विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४२
104
66807
155440
131002
2022-08-01T12:00:40Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.]आपणांपुढील कार्य.२३७
{{rule}}
आपल्या शक्तीचा प्रत्येक अंश खर्च करण्याची तयारी आपण ठेविली पाहिजे.
परदेशीयांनी आपली हजारों सैन्ये वेथे आणून उतरविली तर ते त्यांना
खुशाल करू द्या. त्यांच्या सशस्त्र सैन्यांचा महापूर येथे लोटला तरी त्या
कडे तुम्ही मुळीच लक्ष्य देऊ नका. भरतभूमीच्या लेकरांनों ! जागे व्हा,
उठा; आणि जग जिंकण्यासाठी कंबरा बांधा. प्रेमाने आम्ही द्वेष जिंकू, या
तत्त्वाचा जयघोष याच भूमीत प्रथम ऐकू आला. द्वेष स्वतःला जिंकू शकत
नाही, पण प्रेम त्याला जिंकते. जडवादाचा भयंकर धिंगाणा आज साऱ्या
जगावर चालू आहे. त्याचा पराभव दुसरा जडवाद पुढे करून होणार नाही.
एक जडवाद दुसऱ्याला जिंकील ही गोष्ट त्रिकाळांत घडणे नाही. कारण ते दो
घेही तुल्यबळ आहेत. एक सैन्य दुसऱ्या सैन्याला जिंकण्यासाठी धडपडूं लागते,
तेव्हां माणुसकी मरून मनुष्याच्या अंगी पशुत्वाचा संचार होऊ लागतो. मनु
ध्याचा पशु बनविणे हे मानवी बुद्धीच्या कर्तृत्वशक्तीचे विजयचिह्न आहे
काय ? जडवादाचा पराजय करण्यास एक अतींद्रिय ज्ञानच समर्थ आहे. या
अतींद्रिय ज्ञानाने पश्चिम दिशेला तुम्ही जिंका. राष्ट्र म्हणून आपणांस जगाव
याचे असेल, तर या पराविद्येची जोड आपण मिळविली पाहिजे. या तत्त्वाचे
सत्यत्व पाश्चात्य लोकांस आता हळूहळू पटू लागले आहे. हे ज्ञान आतां कोठून
येते हे पाहण्यासाठी ते उत्सुक होऊन बसले आहेत. ते दृष्टीस पडतांच त्याला
निर्भरालिंगन देण्यासाठी आपले बाहु पसरून ते उभे राहिले आहेत. आतां
त्यांची ही इच्छा कोण तृप्त करणार ? हिंदुस्थानांतील अवतारी पुरुषांचा
संदेश त्यांच्यापर्यंत नेऊन पोचविण्यास कोण तयार आहे ? जगांतील प्रत्येक
कोनाकोपऱ्यांत या संदेशाचा दुंदुभि वाजविण्याकरितां आपल्या सर्वस्वावर
पाणी सोडण्यास कोण तयार आहे ? सत्याचा प्रसार करण्याकरितां असली
अलोट छातीची माणसें आतां हवीं आहेत. वेदांतधर्माची विजयपताका
जगांतील प्रत्येक कोनाकोपऱ्यांत रोवण्याकरितां तयार असलेले शूर वीर आज
हवे आहेत. जगाला याच गोष्टीची आज जरूर आहे. इतकी की, तिच्या अ
भावी जगाचा नाश होईल. झोंपी गेलेल्या ज्वालामुखीच्या शिखरावर आज
सारे पाश्चात्य जग बसले आहे. हा भस्मासुर केव्हां जागा होईल याचा नेम
नाही. तो जागा झाला की, क्षणार्धात साऱ्या पाश्चात्य जगाची राखरांगोळी
करील. वेळ अशी आणीबाणीची आली आहे की, आपले कार्य थांबविण्यास<noinclude></noinclude>
nqg1ee2z7nl8negrjupdt5l3lz1gj5d
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४३
104
66808
155441
131003
2022-08-01T12:08:56Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२३८ स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [नवम
{{rule}}
आता एका दिवसाचाहि अवधि राहिला नाही. युरोपचा नाश उद्या होणार
नाही इतकीहि खातरजमा कोणी देणार नाही. तृष्णेच्या मागे लागून तिच्या
तृप्तीसाठी सा-या जगाचा कोनाकोपरा पाश्चात्यांनी धुंडाळून पाहिला. या
तृष्णेच्या शांतीसाठी शोध करण्यांत जगांतील एकहि स्थळ त्यांनी शिल्लक उरूं
दिले नाही. पण शांतीचा मागमूससुद्धा त्यांना कोठे लागला नाही. इंद्रियजन्य
सुखाचे पेले कांठोकाठ भरून त्यांचे आकंठ पान त्यांनी केले, पण पोटांतील
आगीचा उपशम त्यामुळे झाला नाहीं; तृप्तीची ढेकर त्यामुळे अद्यापि आली
नाही. याकरिता पाश्चात्यांत तुमच्या धर्मज्ञानाचा प्रसार करण्याची ही अ
त्युत्कृष्ट संधि तुमच्या घरी चालून आली आहे. म्हणून हिंदवासीय तरु
णंनो, तुम्हांपुढे आज कोणते कार्य आहे हे डोळे उघडून पहा. जगज्जेते
म्हणून अखंड कीर्ति संपादन करण्याचा योग सुदैवाने तुम्हांस आज प्राप्त
झाला आहे. आता हे कार्य साधा अथवा त्यांत प्राण तरी द्या. तुम्हांला
कांहीं जागृति आतां खरोखरच आली असेल आणि आपल्या राष्ट्रीय जीव
नांत थोडा तरी नवा जोम भरावा अशी थोडी तरी इच्छा तुमच्या चित्तांत
उत्पन्न झाली असेल तर हिंदु तत्त्वज्ञानाचा झेंडा साऱ्या जगभर नाचविल्या
वाचून राहूं नका.<br>
{{gap}}आपल्या धर्मज्ञानाचे साम्राज्य सा-या जगावर गाजवावयाचे असें मी
म्हटले, पण याचा भलताच अर्थ कोणी समजू नये. ज्या विलक्षण भोळसर
समजुतींना कित्येक शतकेंपर्यंत आपण उराशी बाळगले आहे त्यांचा अंत
र्भाव तत्त्वज्ञानांत होत नाही हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. असल्या खुळ्या क
ल्पनांचा प्रसार जगभर करावयाचा हे आपले कार्य नसून, जगाला नव्या
जीवनाची प्राप्ति होईल, असें तत्त्वज्ञान त्याला आपणांस द्यावयाचे आहे.
आपल्या भोळ्या कल्पनांचा प्रसार बाह्यदेशी होऊ द्यावयाचा नाहीं; इतकेंच
नव्हे, तर त्यांचा उच्छेद आपल्या देशांतूनहि करणे आपणांस अवश्य आहे.
त्यांना आतां कायमची मूठमाती मिळाली पाहिजे. त्यांच्या अस्तित्वामुळेच
हिंदुकुलाला अवनति प्राप्त झाली, आणि आता यापुढे ती जगली तर तुमचा
मेंदूहि ती सडवून टाकतील. ज्या मेंदूला उच्च आणि उदार विचार निर्माण
करण्याचे सामर्थ्य नाही, ज्यांतून अस्सल कल्पनाशक्ति नष्ट झाली आहे,
ज्याला कसलाहि जोम उरलेला नाही आणि धर्म म्हणून क्षुद्र भोळसट कल्प-<noinclude></noinclude>
8clmwu5djztjl8ko6mxcd49q3hvoacx
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४४
104
66809
155442
131004
2022-08-01T12:14:05Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.] आपणांपुढील कार्य. २३९
{{rule}}
नांना चिकटून बसून आपलें सारें अस्तित्व जो विषदिग्ध करितो, असला मेंदू
तुमच्या डोक्यांत उत्पन्न होऊ न देण्याविषयी तुम्ही खबरदारी घ्या. हिंदुस्था
नाच्या उन्नतिमार्गात दोन मोठी भयावह स्थलें आज आपल्या नजरेसमोर
आहेत. जडवाद अत्यंत मोहकरूपाने आपणांसमोर उभा ठाकला आहे; आणि
त्याबरोबरच जुन्यापुराण्या खुळ्या कल्पनाहि आपणांस चिकटून बसल्या आहेत.
एका बाजूला आड आणि दुसऱ्या बाजूला विहीर अशी आजची आपली स्थिति
आहे. या दोन्ही भयांना चुकवून आपला पुढील रस्ता आपण सुधारला पाहिजे.
पाश्चात्य विद्येच्या आकंठपानाने आपले डोके धुंद करून घेऊन स्वतःस सर्वज्ञ
समजणारा असा प्राणी आज निर्माण होऊ लागला आहे. आपल्या प्राचीन
ऋषिवर्यांचे ज्ञान त्याला तुच्छ वाटते. त्यांची थट्टा उडवून स्वतःची क्षणभर
करमणूक करून घेण्यासहि तो मागेपुढे पहात नाही. आपले सारे जुनें
तत्त्वज्ञान म्हणजे निवळ अर्थशून्य भारुड, धर्मज्ञान ही शुद्ध बालिश बडबड
आणि हिंदुधर्म म्हणजे गाढवांचा गोंधळ असें त्याला वाटते. याच्या अगदी
उलट असा दुसराहि एक नमुना आढळून येतो. हा दुसरा गृहस्थ सुशिक्षित
पण एकविषयभ्रांत असतो. पहिला जसा एका टोकाला तसाच हा दुसरा
दुसऱ्या टोकाला जाऊन बसलेला असतो. पालीची कारिका, शिंकेचें फळ,
आणि काक शब्दाचें फळ काय आहे, हेच तो शोधीत असतो. आपल्या
प्रत्येक वेडामागे धर्मज्ञान उभे आहे; आणि तत्त्वमीमांसेचे पाठबळ त्याला
आहे, असे त्याला वाटत असते. आपल्या खेड्यांतला म्हसोबा हाच त्याचा
देवाधिदेव. आपल्या खेड्यांतील प्रत्येक चालरीत हीच त्याची वेदाज्ञा; आणि
यांतील एखाद्यांत थोडीशीहि चूक होऊ न देण्याविषयीं तो दक्ष असतो.
आपली ही व्रतें तंतोतंत पाळणे हाच राष्ट्रोद्धाराचा मार्ग आहे असे त्याला
वाटते. ह्या दोन्ही नमुन्यांवर फार सावधगिरीची नजर आपण ठेविली
पाहिजे. शुद्ध निरीश्वरवादी बनून चार्वाकाचे कट्टे शिष्य तुम्ही झाला तरीहि
एकवार मला पुरवेल, पण बालिश कल्पनांना धर्म म्हणून तुम्ही चिकटून
बसला तर ते मला नको. निरीश्वरवादी कितीहि वाईट झाला तरी तो जिवंत
प्राणी असतो. स्वतःच्या कर्तबगारीवर त्याचा काही तरी विश्वास असतो.
अशा माणसाचा थोडाबहुत तरी उपयोग तुम्हांस करून घेतां येण्यासारखा
आहे. पण धर्म म्हणून शुद्ध मूर्खत्वाला ज्याने मिठी मारली, त्याचा मेंदू कामां-<noinclude></noinclude>
1uxlc4uxzodsy3gewdq2uybf8lpve3x
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४५
104
66810
155443
131005
2022-08-01T12:21:54Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>२४० स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ. [ नवम
{{rule}}
तून गेला असें तुम्ही समजा. तो खराखुरा अवनतीच्या मार्गाला लागला
असून त्याचा उपयोग कोणासहि होण्यासारखा नाही. ही दोन्ही भयावह
स्थलें आपण टाळली पाहिजेत. आपणांस आज शूरांची गरज आहे.
ताज्या दमाने ज्याचे रक्त सळसळत आहे अशी माणसे आपणांस हवीत.
लोहमय स्नायु आणि पोलादी ज्ञानतंतु असलेली माणसें आज आपणांस
हवीत. हवें तेथें वांकणाऱ्या विळविळीत प्राण्यांची आपणांस गरज नाही.
असल्या प्राण्यांचे आधी उच्चाटन होऊ द्या. धर्म हा मोठा गहन विषय
आहे असे म्हणून धर्मज्ञान अंधारांत लपवू पाहणाऱ्या माणसांचीहि गरज
आपणांस नाही. धर्ममार्गात कसलीहि लपवाछपवी नको. वेदांतांत
असला लपंडाव तुम्हांस कोठे आढळतो काय ? श्रुति, संहिता, पुराणे यांत
त्याचा मागमूस तुम्हांस कोठे लागला आहे काय ? आपल्या प्राचीन ऋषि
वर्यांनी तत्त्वज्ञानाच्या शोधासाठी गुप्त मंडळ्या स्थापन केल्या होत्या हे माझ्या
तरी ऐकिवात नाही. ते काही हातचलाखी करीत होते, असें कोठे नमूद
केल्याचे तुम्हांस ठाऊक आहे काय ? आपलें ज्ञान जगासमोर मांडण्यासाठी
ऐंद्रजाल त्यांना करावे लागले, असा इतिहास तुम्ही कोठे वाचला आहे काय ?
धर्मज्ञान सात पडद्यांत लपवून ठेवू पहाणे आणि वेडगळ गोष्टींना चिकटून
बसणे हे दुबळेपणाचे चिन्ह आहे. अवनतीच्या आणि मृत्यूच्या या आगामी
निशाण्या होत. याकरितां त्यांपासून तुम्ही फार सावध रहा. बलवान् व
स्वावलंबी होणे हा आपल्या पुढील मार्गातील पहिला मुक्काम आहे. स्वावलंबी
होणे ही गोष्ट खरोखरच अत्यंत महत्वाची आहे. स्वावलंबित्वाचा उपयोग
आपणास किती प्रकारे करून घेता येतो, याची पुरती कल्पनाही करवणार
नाही. आपला जो काही स्वभाव सध्या बनला आहे, त्याला अनुसरून या
दोन वस्तू आपणांस अप्राप्यसुद्धा वाटतील इतक्या त्या मोठया आहेत; पण
वस्तुस्थिति अशी नाही. त्यांत कांहीं गौप्य नाही. प्रत्येकाला त्या साधून घेतां
येण्यासारख्या आहेत. हिमालयाच्या हिमस्नात शिखरावर बसलेल्या गुप्त महा
त्म्यांच्या स्वाधीन ही तत्त्वे कोणीहि केली नाहीत. कोणाहि गुप्तमंडळ्यांनी
त्यांचा कुणगा करून ठेवलेला नाही. धर्मतत्त्वे ही गुप्त ठेवण्यासारखी वस्तु
आहे, या शब्दांचा उच्चार या भूमीत पूर्वी केव्हांहि झालेला नव्हता. हिमाल
याचा प्रवास मी स्वतः केलेला आहे. तुम्ही गृहस्थाश्रमी आणि हिमाचल<noinclude></noinclude>
e1f062xiw0ja5qfjdqnqdyti847ptpx
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२४६
104
66811
155444
131006
2022-08-01T12:28:45Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खंड.] आपणांपुढील कार्य. २४१
{{rule}}
फार दूर यामुळे तुम्ही तेथे गेला नसाल; पण मी बोलून चालून संन्यासी.
गेली चवदा वर्षे मी एकसारखा भटकत आहे. सारा हिमालय पर्वत मी
धुंडाळून पाहिला, पण गुप्त मंडळ्या कोठे असल्याचा सुगावा मला लागला
नाही. याचे कारण हेच की, अशा मंडळ्या अस्तित्वातच नाहीत. याकरितां
असल्या मृगजळाच्या मागे धावत सुटूं नका. असली खुळे डोक्यात घेण्या
पेक्षा तुम्ही नितांत जडवादी बनला तरी तुमचे आणि सा-या हिंदुकुलाचें
अधिक कल्याण होईल. तुम्हीं शुद्ध नास्तिक बनला तर किमान पक्षी तुम्ही
स्वावलंबी आणि आत्मप्रत्ययी तरी व्हाल. प्रत्येक गोष्टींत दुसऱ्याच्या तोंडा
कडे पाहण्याची तुमची दुष्ट खोड तरी नाहीशी होईल; पण असल्या खुळसट
कल्पनांमागे वेड्यासारखें धावत सुटणे हे मात्र अवनतीचे आणि विनाशाचें
निश्चित चिह्न आहे. या कल्पना उघड उघड इतक्या वेडगळ आहेत की, त्यांचा
नुसता विचार करण्यांत काळाचा अपव्यय काही चांगले लोकसुद्धा कसा
करितात याचे मला मोठे नवल वाटते. ज्या समाजांत असली माणसें निर्माण
होतात त्याला धिक्कार असो. चांगल्या माणसांनी सुद्धा असली खुळे निर्माण
करण्याच्या नादी लागावें आणि त्यांचा शास्त्रोक्त अर्थ लावण्याचाहि यत्न करावा
हे माणुसकीला मोठे लांछन आहे. सा-या जगाच्या वाड्मयभांडारांत इतका
सडका माल दुसऱ्या कोठेहि नसेल. तुम्हांस आतां कांहीं करावयाचे असेल
तर प्रथम धैर्यवंत व्हा. असल्या वेडगळ कल्पनांना शास्त्राधार शोधू नका.
आमच्यांत असल्या खुळसटपणाचा भरणा आधीच कांहीं थोडा नाही. मग त्यांत
यांची भर कशाला? ज्या आहेत त्यांचेच उच्चाटन आधी झाले पाहिजे. आपल्या
शरिरावर आधीच असलेले व्रण प्रथम बरे केले पाहिजेत. ते न करता त्यां
हुन अधिक जाज्वल्य आणि प्राणघातक काळपुळ्या निर्माण करणे शहाणपणाचें
होईल काय? काही झाले तरी आमचे पहिले व्रण बिचारे गरीब स्वभावाचे
आहेत; ते प्राणघातक नाही इतकेंतरी खास. हे व्रण बरे झाले म्हणजे
आमच्या धर्मतत्त्वांचा देह तप्तकांचनासारखा उज्ज्वल आणि सुशोभित
होईल. या तत्त्वांचे शोधन करा आणि त्यांनाच चिकटून रहा.<br>
{{gap}}आपलाच धर्म सार्वलौकिक होण्याच्या योग्यतेचा आहे, असे प्रत्येक
धर्माचे अनुयायी म्हणतांना तुम्ही ऐकतां; पण तुम्ही ही गोष्ट लक्ष्यांत ठेवा
की, सारे जग कोणत्याहि एकाच धर्माचे अनुयायी बनेल, ही गोष्ट कधीच
स्वा०वि० ख०-९-१६.<noinclude></noinclude>
p5nnvh22612mulp95423ymebgrocehw