विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७०
104
70893
155665
2022-08-12T06:04:20Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>पंचनद्यांचे नृत्य भरतनाट्यम शैलीत बसवून घेतले होते. अनूचे जेष्ठ सहकारी प्राध्यापक अण्णा अणदुरे यांचा हात लिहिता होता. 'गल्ली ते दिल्ली' हे राजकारणाची खिल्ली उडविणारे खुसखुसीत वगनाट्य त्यांनी लिहिले होते. ते वाचून श्रीलही उर्मी आली. आणि त्यानेही वगनाट्यात भोळ्या संभ्याची भूमिका केली. नाठाळ नि भांडखोर मंगलीची भूमिका अनूने छोट्या ईराला सांभाळत टेचात रंगवली. अन्नदाता या नृत्यनाट्याच्या सुरवातीला अनूतल्या कवयित्रीने एक तुकडा जोडला होता.
{{center|<poem>सधन सावळे मेघ भरारा वाऱ्यावर वाहती
पाण्याच्या पांगळ्या पखाली दूर दूर नेती
काळी आई तहानलेली सुकलेल्या ओठांनी
ग्रीष्माच्या तलखीत आळविते पाण्याची गाणी..</poem>}}
नृत्य करणारे शेतकरी... शेतकरणी लयबध्द अभिनयातून पावसाची वाट पहाणे, मातीला स्पर्श करून तिचे कोरडेपण, तिचे पावसासाठी आसुलेले मन साकार करीत. ते पाहतांना मराठवाड्यातील प्रेक्षकांना दुष्काळ आठवे.
{{gap}}त्या वर्षी थेट हिंगोली पासून ते उदगीर औरंगाबादपर्यंत कला पथकाचे कार्यक्रम झाले. खुर्दा बराच जमला. बक्षीस समारंभासाठी या वेळी सुधाताई, बापूसोबत एसेम् अण्णांना बोलावण्याचा घाट घातला. एसेम् अण्णा आले नेहमीप्रमाणे शेवटच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत अर्जुनराव सरांनी हिशेब सादर केला. त्यात यावर्षीचा बारा प्रयोगातून खर्च वजा जाता सात हजार रूपये उरले होते. त्यातील पुढील वर्षाच्या तयारीसाठी हजार रूपये ठेवून, छोट्या कलाकारांना बक्षीसे देऊन डोंगर विकासासाठी काम करणाऱ्या बदलाव संघटनेस पाच हजार रूपयांची मदत जाहीर करून एस्सेम अण्णांच्या हाताने ती रक्कम श्रीनाथला दिली होती. अण्णांनी बदलाव संघटनेने केलेल्या विविध आंदोलनाची माहिती घेतली होती. रात्रीच्या जाहीर सभेत बदलावंच्या युवाशक्तीचे अभिनंदन करताना ते म्हणाले होते,
{{gap}}"लोकशाही अर्थपूर्ण करायची असेल तर केवळ कायदा करून भागत नाही. लोक शिक्षणावर भर दिला पाहिजे. कलापथक हे लोकरंजनातून लोकशिक्षण देणारे प्रभावी माध्यम आहे. समाजात जो अगदी शेवटच्या पायरीवर आहे त्याच्या हिताचा विचार सतत मनात ठेवला पाहिजे. त्याच्या विकासाशी आपली बांधिलकी आहे. आज राज्यकर्ते नैतिक मूल्याबद्दल बेपर्वा झालेत. अशा वेळी आपला संघर्ष रचनात्मक हवा. तुम्ही विधायक काम करीत आहात. ते लोकशिक्षणाचे प्रभावी साधन आहे.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७० }}</noinclude>
8hamd9jd746yzi7fbtfbss9h4rn3bes
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७१
104
70894
155666
2022-08-12T06:07:59Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>परंतु विधायक कार्य करणाऱ्यांच्या मनात समताधिष्ठीत समाजाच्या ध्येयाची स्पष्ट कल्पना नसेल तर मग ते 'दिखावू कर्मकांड' बनते. बदलावने आपल्या तरूण मित्रांच्या मनात समताधिष्ठित समाजाची संकल्पना स्पष्टपणे गोंदवावी. राष्ट्र सेवा दल, समाजवादी पक्ष नेहमीच तुम्हाला मदत करील."
{{gap}}त्यानंतरच्या बदलावचे तरूण डोंगर भागात नियमितपणे जाऊ लागले होते. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक यांनी लहान शेतकऱ्यास सहाय्यक ठरणारी सामुदायिक विहिरीची योजना जाहीर केली. पण प्रत्यक्षात विहिरी कागदावरच राहिल्या. काही अर्धवट तर काहींचे नुसते खड्डे खोदलेले. चांगल्या योजनांचा खेळखंडोबा करून स्वत:च्या तुंबड्या भरणारी शासकीय यंत्रणा आणि सत्ताधाऱ्यांच्या या कारवायांवर श्रीनाथ, अण्ण्या प्रकाश, बप्पा आदींनी डोंगरात व अलिकडच्या भागात फिरून शोध घेतला. श्रीनाथने त्यावर प्रत्यक्ष माहिती व आकडेवारीचा आधार घेऊन लेख लिहिले. ते 'माणूस' या पाक्षिकातून प्रसिध्द झाले. लेखांनी अधिकाऱ्यांची झोप उडवली होती. आणि पुढाऱ्यांचीही. ते दिवस आठवून अनूचे मन आतल्या आत गुदमरून जाई. वाटे, मी मात्र संसार आणि नोकरीचं एकसुरी गाणे गात वाटेतल्या विसाव्याच्या दगडासारखी एकजागी उभी आहे. अस्वस्थता मनात घेऊन आली की ती राम मनोहर लोहियांचे 'ललितलेणी' किंवा विनोबाजींचे 'गीता प्रवचने' समोर घेऊन बसत असे. ललितलेणी मधील शेवटचा लेख 'अथ योगानुशासनम्' बळ देणारा होता. बेचाळिसच्या काळातल्या राजकीय कैद्यांचा छळ इंग्रजांनी टोकाला जाऊन केला. त्यात संयमाने रहाणारे कैदी... डॉ. राम मनोहर नोंदवतात, 'एक शिपाई सगळ्या राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या नावाने शिव्या घालू लागला. माझे पित्त खवळले तरीही मी गप्प बसलो. मग त्याने गांधीजींचेही नाव घ्यायला सुरवात केली. 'चूप बस' असे मी बेंबीच्या देठापासून किंचाळलो. त्या किल्ल्यात बाजूबाजूला कोणी मित्र नव्हते माझ्या ओरडण्याला अर्थ नव्हता. अशावेळी माणूस विचार करून थोडाच वागतो? अविवेकाने शरीराचा ताबा घेणे हेही निकोपपणाचे लक्षण आहे....'

{{Css image crop
|Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf
|Page = 71
|bSize = 380
|cWidth = 36
|cHeight = 24
|oTop = 470
|oLeft = 290
|Location = right
|Description =
}}<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७१ }}</noinclude>
pdqyjw3w7xhqixkrr6dms2yrfkcuhkz
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७२
104
70895
155667
2022-08-12T06:12:39Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|{{x-larger|'''६.'''}}}}

{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}

अनू जिना चढून वर घरात आली. भाजी टोपलीत भरतांना कालनिर्णयाकडे लक्ष गेलं. आज मंगळवार उद्या पोस्टात पत्र पडायला हवं.
{{gap}}कनक ईरा झोपले होते. अनू पत्र लिहायला बसली. गेल्या सहा महिन्यानंतरचे हे पहिले पत्र.
{{gap}}"....इथे सगळंच कसं शान्त आहे. अर्थात समाजातला वरचा थर, ...सर्वच अर्थाने. अधिकारी, प्राध्यापक, बडे व्यापारी वगैरे. खालच्या... तळागाळातल्या लोकांना तर दोन वेळेची भूक भागवितांना जीव मेटाकुटीला येतो. शिक्षक मात्र वैतागले आहेत. कुटुंबनियोजनाच्या केसेस मिळविण्यासाठी घराघरांना चाचपीत गल्लीबोळांतून हिंडताहेत. कोटा पूर्ण केला नाही तर पगार बंद. बिच्चारे ! आणि खेड्यात तर धसका घेतलाय लोकांनी. लाल फुलीची गाडी, नाही तर लाल दिव्याची गाडी पाहिली की खेड्यातील माणसे आडोसा शोधीत पळतात.
{{gap}}कॉलेज मधल्या चहाच्या वेळेतल्या गप्पासुध्दा थंडावल्या आहेत. आपल्या घरापुढे कायम साध्या वेशातले दोन सी.आय.डी.पोलिस बसलेले असतात. पाणी प्यायचं झालं तरी आपलंच दार ठोठावतात. त्यांची डयुटी बजावतात बिचारे!
{{gap}}या वर्षी गणेशोत्सवात कलापथक नेहमीप्रमाणे बसवलं होतं. बापटकाकांचं 'अन्नदाता' नृत्य, 'बिनबियाचं झाड' हा व्यंकटेश मागडगूळकरांचा वग आणि काही समूह गीतं. शेवटी कुसमाग्रजांची 'किनारा' कविता सादर केली होती. पहिला कार्यक्रम गणेशचतुर्थीला केजला केला. आणि दुसरा आपल्या आंब्याला. देवीच्या देवळातल्या पटांगणात. नेहमीप्रमाणे खच्चाटून प्रचंड गर्दी जमली होती. योगेश्वरी मंदिराच्या उजवीकडच्या चौथऱ्यावर ताडपत्री टाकून रंगमंच तयार केला होता. 'राष्ट्रसेवादल कलापथक : गणेशोत्सव १९७५: अंबेजोगाई' ही अक्षरं आपल्या<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७२ }}</noinclude>
mxekvkhv5d5jljfuf8rgzc9giadeotv
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७३
104
70896
155668
2022-08-12T06:16:53Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>ड्राईंग मास्तरांनी, अशोक डुमरेनी सोनेरी रंगाचा कागद आणून, गर्द निळ्या रंगाच्या पडद्यावर चिटकावून दिली होती. तो पडदा रंगमंचाच्या मागे लावला होता. पडद्याचं कापड चक्क सारडाजींनी दिलं. ठाण आणून टाकलं समोर. म्हणाले, लागेल तेवढे वापरा. काम झालं की धून, इत्री करून, विकून टाकू.
{{gap}}तुला ललितमोहन आठवतो? राजासाबांचे धाकटे चिरंजीव आणि दिन्या चाटे. दोघेही तसे आगाऊच. पण यंदा कलापथकाचे कार्यक्रम झालेय पाहिजेत, हा आग्रह त्यांचा. आणि पुढकारही. तालमींच्या काळात बालकमंदिरा जवळच्या अश्रफमामूच्या हॉटेलातून चहा येई अगदी रोज. रंगीत तालमींच्या दिवशी जगूभाऊ पैसे द्यायला लागले तर घेतले नाहीत. उलट म्हणाले, 'अरे हम तो कायर है। हमारे मोहल्लेमे रहनेवाले सय्यदसाब का लडका अमन भी श्रीभैय्याके साथ जेलमे है। अपने गांव के पाससे जादा आदमी....बुढे, जवान, पढ़ेलिखे सबको बाईने 'मिसा' में डाला है। मन बहुत जलता है। लेकिन क्या करे? इतना तो करने दो हमे। भाभी को बोलो...' समाधान हॉटेलचे द्वारकाभाऊ अधूनमधून येत. येतांना सगळ्यांसाठी गरम पोहे आणित. जेठा न्हाव्याचं काम करतो. आणि नंदा न्हाविणीचं. अगदी तुझी आठवण यावी असा अभिनय. उस्मान पानवाला, वकीलसाहेब, (यंदा नक्की पास होणार आहेत, म्हणे!) सगळेच मदत करतात. परवा सुभानराव येऊन गेले. जातांना आग्रहाने सांगून गेले की काही मदत लागली तर संकोच करू नका. त्यांना तरी ही आणीबाणी कितपत बरी वाटते देव जाणे! भलेही काँग्रेसचे असतील.
{{gap}}अरे, जनक काठीवरच्या पायट्यांवर पाय ठेऊन तालात नाचतो. अगदी सराइतपणे मोठ्यामुलांच्या घोळक्यात हे चिंचेचं बुटूक. भरपूर टाळ्या घेतल्या....
{{gap}}तर कार्यक्रम चढत चढत कळसाला पोचला. शेवटी सगळे रंगमंचावरचे, मागचे कलाकार रंगमंचावर आले आणि गीत सुरु झाले.
{{center|<poem>"उद्दाम दर्यामध्ये वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हाकारा
आलाऽऽ किनाराऽऽ"
आणि मग टाळ्यांचा कडकडाट</poem>}}
{{gap}}... दुसऱ्या दिवशी मलाही पोलिस स्टेशनवर बोलावणे. कार्यक्रमातील काही<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७३ }}</noinclude>
6pjlix9c8azhrtor18qh1pwzj3zm0jk
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७४
104
70897
155669
2022-08-12T06:24:12Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>गाण्यांवर आक्षेप. काही शब्द म्हणे समाजात अशांती पसरवणारे उदा. 'उद्दाम'. वीर सावकरांचे 'ने मजसी ने परत मातृभूमीला' हे गाणे गाळा. आणि पुन्हा नम्र विनंती. "माँ तेरे बीसी सपने, साकार करेंगे' अशी राष्ट्रप्रेमाची गाणी म्हणा, वगैरे. अर्थात् हे सारे चर्चेत. लेखीबिखी नस्से. नवा पी.एस.आय. तरूण आहे. शेवटी त्यानेही प्रामाणिकपणे सल्ला दिला.
{{gap}}"मॅडम, तुम्ही फक्त महाविद्यालयात शिकवा. मुलांचे वडील नाशिक जेलमध्ये 'मिसा' खाली आहेत. मुलं लहान, कलापथकही बंदच ठेवा..." क्षणभर थांबून त्याने विनंती केली, "धाकटा भाऊ म्हणून माझे एवढे ऐकाच". मी बी.ए.ला विंदांचा 'मृदगंध' शिकवतेय. "माझ्या मना बन दगड हा संदेशच खरा का?"
{{gap}}श्रीनाथने एक हलकासा निश्वास टाकीत अनूच्या पत्राची घडी केली. ती बॅगेत नीट ठेऊन, तो परत पुस्तकात शिरला, 'रेड चायना टुडे' हे अेडगर स्नोचं पुस्तक हाती आल्या पासून आलीबाबाच्या गुहेत शिरल्यासारखं झालंय. जेलमध्ये आल्यापासून वाचन मात्र खूप चाललंय. बाकी उद्योग काय दुसरा? माओची वाक्य मनात घुमतच राहतात. त्याला माओचे वाक्य आठवले.
{{gap}}... We should not feel ashamed to ask and learn from people below. Be a pupil before you become a teacher. Listen to the mistaken views from below, it is wrong not to listen to them.'
{{gap}}"तळातल्या सामान्य माणसाने विचारलेल्या भोळ्या भाबड्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. त्यातूनही खूप शिकता येते. मास्तर... शिक्षक होण्याआधी विद्यार्थी व्हा. त्यांचे चुकीचे वाटणारे विचार लक्षपूर्वक ऐका. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचे म्हणणे न ऐकणे ही सर्वात मोठी चूक आहे." पुन्हा एकदा श्रीनाथने आपली नजर पुस्तकात खोचली. डोंगरातील लहान कोरडवाहू शेतकरी, बलुतेदार, भूमिहीन यांच्या सोबत पुढे काम करायचे तर हे वाक्य खोलात जाऊन समजून घ्यायला हवे असा विचार त्याच्या मनात आला.
{{gap}}एक दिवस सकाळच्या भत्त्याच्या वेळी बातमी आली. आमदार धोंडग्यांनी उपोषण करण्याचा सज्जड दम भरल्यामुळे, व्यक्तीला ट्रांझिस्टर बाळगण्याची संमती दिली नाही तरी प्रत्येक बराकीत कार्यालयातील रेडीओचा कर्णा बसवणार आहेत. आणि मग बातम्यांची वेळ झाली की कर्ण्याभोवती सगळे जमत. सगळ्यांनाच जेलचीही बऱ्यापैकी सवय झाली आहे.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७४ }}</noinclude>
cs9gfn1716xs1dxc61l3rvhyqx6hg18
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७५
104
70898
155670
2022-08-12T06:32:49Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}जेलच्या मध्यभागी ग्रंथालय होते. त्यात काही दैनिके येत. पुस्तके मात्र या मिसावाल्यांना फारशी न आवडणारी. पहिली दुसरीत आहोत असे वाटावे, अशी. पण गेल्या काही दिवसांपासून भेटायला येणाऱ्यांना लाडू चिवड्या बरोबर पुस्तके आणण्याचीही परवागनी मिळाली होती. आणि म्हणूनच श्रीभैय्या दिवसभर 'रेड चायना टुडे' या ग्रंथात डुबकी मारून बसत.
{{gap}}सेपरेट मध्ये गजाच्या दारातून थंडी, वारे आत येई. सर्वांनी ओरडा केल्यावर चवाळ्याचा... पोत्याच्या जाळीदार कापडाचा पडदा लावण्यात आला. तरीही फरशीवर टाकलेली सहा फुट लांब नि दोन फुट रूंदीची सतरंजी आणि काथ्या भरलेली टुचटुचणारी उशी यांचा सहवास असह्य होई.
{{gap}}"सेवादल हा माझा प्राण आहे" असे म्हणणारे मातृहृदयी पू. साने गुरुजी नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात "वॉरंटाईन" विभागात होते. काही अति महत्वाच्या राजबंद्यांना या विभागात ठेवित. माजी खासदार मोहन धारीया, माजी आमदार डॉ.बापू काळदाते यांना त्या विभागात ठेवले होते. या दोघांनी आग्रह केल्यामुळे दैनिक मराठवाडाचे संपादक श्री.अनंत भालेराव यांना तिथे ठेवले.
{{gap}}इंदिरा गांधींची राजनिती त्यांच्या मनाचा थांग हाती लागू नये अशी. तसेच शासनाचे धोरण, एसेम जोशी, ना.ग.गोरे, उत्तमराव पाटील व बिनीच्या वृध्द पुढारी मंडळींना मात्र मोकळे ठेवले होते. अर्थात ही मंडळी स्वस्थ बसलेली नव्हतीच. यदुनाथ थत्ते इसापनितीच्या कथा मुलांना कथा-मालेतून सांगत. त्या कथा ऐकण्यासाठी मुलांएवढीच मोठ्यांची गर्दी असे. एसेम जोशी-आण्णा सतत फिरत होते. दीडशे वर्षानंतर मुक्त झालेल्या स्वातंत्र्य देवतेचे हातपाय कसे बांधून टाकले आहेत, हे गावोगाव जाऊन ते आपल्या धारदार साध्या भाषेत लोकांना सांगत. अण्णांनी जणू पायाला चाकेच बांधली होती. एक दिवस त्यांनी जाहीर केले मिसातील सर्व राजकीय कैद्यांना राजबंदी हा दर्जा आणि अ वर्ग मिळाला पाहिजे असे केले नाही तर अण्णा आमरण उपोषण करणार होते. एका जागी न बसता आणीबाणी विरूध्दचा प्रचार न थांबवता सत्तरी ओलांडलेला हा नेता. त्याच्या शब्दांना विलक्षण वजन आणि धार होती. शब्दात कणखर निग्रह होता. उत्तरेकडून घोंघावरणाऱ्या वादळांनाही सह्याद्रीच्या उंच दगडी माथ्यापुढे मान झुकवावी लागली. एक दिवस अचानक जेलर साहेब आले. सर्व मिसा राजबंद्यांना अ वर्ग मिळाल्याचे त्यांनी सांगितले. बावनपत्तेकी... साग<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७५ }}</noinclude>
jkixvpo2ybkt2k3irz13hnebciakfju
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७६
104
70899
155671
2022-08-12T06:43:20Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>तरकारीचा भत्ता संपला. पोळी भाजी मिळू लागली. पाहता पाहता सात महिने उलटून गेले होते. एका खोलीत दोन जणांना ठेवत.
{{gap}}या निर्णयामुळे जेलच्या अधिकाऱ्यांची धांदल उडाली. नाशिक मध्यवर्ती कारागृहात सुमारे पंधराशे मिसा राजबंदी होते. एवढ्यांना कॉट्स, टेबल, टेबल लॅम्प, गाद्या, ऊशा... एवढ्या मोठ्या प्रमाणावर या वस्तू अवघ्या काही दिवसात तयार करण्याची धांदल उडाली. काथ्याच्या उशीचा सहवास संपला. गादी मिळाली. कॉट आला. मऊ गादी, दोन उशा, एक तकिया, पांढरी चादर, दोन कॉटस च्या मध्ये टेबल आणि त्यावर चक्क वाचण्यासाठी टेबललॅम्प. रात्रभर वाचायला परवानगी. सायंकाळी लावले जाणारे कुलूप काढले गेले. रात्री पूर्ण बराकीलाच कुलूप घालीत. त्यात भर अशी मुंबईकर मंडळीनी ट्रकभरून पुरणपोळ्या आणि ट्रकभरून पुस्तके पाठविली.
{{gap}}मिसा राजबंद्यांची आवक मात्र थांबली नव्हती. एक दिवस मराठवाड्यात आदराचे स्थान असलेले त्र्याऐंशी वर्षाचे शर्माजीही यासर्वात दाखल झाले. सगळे मिसा कैदी शर्माजींना नानाजी म्हणून हाक मारतात. महात्मा गांधीजी आणि विनोबाजी यांच्या आचार विचारांच्या अत्यंत निरोगी... निरामय मिश्रणातून साकारलेली मूर्ती म्हणजे नानाजी. महात्माजींनी १९३० साली मिठाच्या सत्याग्रहासाठी तीस जणांची निवड केली होती त्यातले एक नानाजी होते. नानाजींच्या डोळयातून नेहमी अपार माया, आत्मीयता पाझरत असते. आणीबाणी जाहीर झाली तेव्हा नानाजींनी त्र्याऐंशीव्या वर्षात नुकतेच पाऊल टाकले होते. पण चालणे मात्र ताठ. खादीचे धोतर. पांढरा धुवट नेहरू शर्ट. अर्थात् तोही पांढराच. खांद्यावर गमछा. कपाळ आणि डोके यांच्यातली सीमारेषा पार पसलेली. चकचकित टक्कल असलेल्या डोक्याला पांढऱ्या तुरळक केसांची झालर. डोक्याच्या डाव्या बाजूला काळा तीळ. असे हे नानाजी पहाटे पाचला उठून प्राणायाम करतात. थंड पाण्याने स्नान करतात. नंतर दोन तास चरख्यावर सूत काततात. त्यांच्या चरख्याच्या आवाजालाही एक पवित्र लय होती. त्या आवाजनेच पहाट उजाडते. नानाजींच्या भत्त्यावर अमन, अशक्या, बन्सी यांच्या उड्या असतात. जेलरनाही नानाजीबद्दल नितांत आदर आहे. ते त्यांच्यासाठी घरून गुळ आणून देतात. नानाजींचा भत्ता म्हणजे गुळाचा खडा आणि तांब्याभर पाणी. असे हे नानाजी सत्याग्रह करून नासिक कारागृहात आले आहेत. नानाजी इंदिरा गांधीचा उल्लेख नेहमीच 'इंदू बिटिया' असा करतात. पहिल्या स्वातंत्र्य लढ्यात एकूण सात वर्षे तुरुंगात काढलेल्या नानाजींनी दुसरे स्वातंत्र्य मिळविण्यासाठीही<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७६ }}</noinclude>
msxd561vfm61sonebkqfmpiwcqxepbu
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७७
104
70900
155672
2022-08-12T06:50:21Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>सतत सत्याग्रह केला. खरे तर नानाजीचे मोठे चिरंजीव दोनवेळा खासदार म्हणून निवडून आलेले, काँग्रेसचे लोकप्रिय आणि सद्भावी कार्यकर्ते. पक्षापेक्षाही लोकनीती आणि सामाजिक न्याय श्रेष्ठ असे नानाजींचे ठाम मत आहे. सुरवातीला पोलिस नानाजींना पकडत आणि लगेच सोडून देत. नानाजींना सोडून दिले की लगेच चार दिवसांनी ते शहराच्या मध्यवर्ती चौकात आणीबाणीचा निषेध करणारा फलक घेऊन सत्याग्रह करीत. शेवटी नाइलाजाने त्यांची रवानगी नासिकच्या मध्यवर्ती कारागृहात झाली आहे. पूर्ण मराठवाडयात या सात्विक स्वांतत्र्य सैनिकाबद्दल नितांत प्रेम आहे.
{{gap}}अशात अस्वस्थ करणाऱ्या बातम्या येत आहेत. वसंत ऋतु संपला आहे. जेलमध्ये येऊन वर्ष झाले आहे. जेवण बरे असते, तुप, गुळ सारे मिळते. पण दिवस जाता जात नाहीत. जमात ए इस्लामीच्या विदर्भातल्या कार्यकर्त्याचे वडील अल्लाला प्यारे झाले. पण त्यांचा जनाजा उचलण्यासाठी, पित्याला शेवटचा खांदा देण्यासाठी मझर भाईना पॅरोल मंजूर झाला नाही. दातार काकांच्या पत्नी दोन वर्षापासून कॅन्सरने आजारी होत्या. त्यांच्या मृत्यूची बातमी आली. पण काकांना नाशकातल्या नाशकात जाण्यासाठी दगडी भिंत ओलांडता आली नाही. अशा बातम्या आल्या की वाटे दहा दिशांना फक्त अंधाराच भरलाय. उजेडाचे स्वप्न पाहण्याचे धाडस हरवू लागलेय. परंतु जाती धर्माच्या वैचारिक मतभेदांच्या भिंती मात्र ढासळू लागल्या होत्या. अगदी सहजपणे, नकळतपणे, दातारकाकांचा हात मायेने घट्ट धरून मुक्याने अश्रू गाळीत सांतवन करणारे रमजानभाई, दुःखाच्या आवेगाने कोसळलेल्या तरूण मझरभाईला कुशीत घेऊन त्याच्या डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवणारे कुलकर्णी काका...
{{gap}}अशोक, अण्ण्या, अमन अलिकडे अबोल झाले होते. सतत सलणारं, कुणाला सांगायलाही संकोच वाटावे असं एकटेपण सगळ्यांनाच अबोल करणारे. औशाच्या सहदेव सोळुंके या तरूण वकिलाच्या पत्नीने एकटेपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची वार्ता आल्यापासून जो तो आतून हादरला होता.
{{gap}}श्रीनाथ कोऱ्या करकरीत मनाने व्हरांड्यातून वेगाने फेऱ्या मारू लागला. मध्यरात्र उलटली होती.
{{gap}}नरहरी अण्णा पायाची जुडी करून भोवती हात बांधून डोळे मिटून कॉटवर बसले आहेत. त्यांनाही झोप येत नाहीय. त्यांना मुल ना बाळ, देवाघरी गेलेल्या धाकट्या बहिणीची मुलं आपलीच म्हणून सांभाळणारे नरहरी अण्णा. त्यांची साधी<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७७ }}</noinclude>
fkz3uom029ooyizwmq1ef9nb4ua91zx
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७८
104
70901
155673
2022-08-12T06:56:54Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>सुधी अडाणी पत्नी. कशी सांभाळत असेल ती मुलांना? कसे भागवीत असतील दोन वेळेची भूक? त्याचाच तर विचार करीत असतील का अण्णा? त्यांच्याच खोलीतले प्रशादजी उशा जवळ डायरी आणि चष्मा ठेवून शांतपणे झोपले आहेत. काय लिहिलं असेल त्यांनी दैनंदिनीत? गांधीजींच्या विचारांवर अपार निष्ठा आणि श्रद्धा असलेला हा मराठवाड्यातील सर्वोदयी संत. ओठांवर नेहमी मंद, तृप्त हसण्याची लहर. सहा फुटी उंची आरपार ठाव घेणारे नम्र डोळे. त्यात करूणा. खादीचे धोतर, फिकट रंगाचा नेहरू शर्ट आणि गमछा असा साधा वेश. आचार्य विनोबाजींनी आणीबाणीला 'अनुशासनपर्व' असे संबोधले. प्रशादजींना त्याबद्दल काही प्रश्न केला की ते काहीसे मिस्कीलपणे हसत. त्या हसण्यातही सहजता. त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दैनंदिनीत नक्कीच नोंदवल्या असतील. काय असतील त्या? श्रीनाथच्या मनात आले.
{{gap}}त्या खोलीत पलिकडची खोली अमन आणि सुधीरची. त्याच्या नंतर अशोक आणि बन्सीधरची. कसे निवांत आणि मस्त झोपलेत.
{{gap}}पत्नीच्या मुलाबाळांच्या सहवासाची किती सवय होत असते ना? जनक आणि इराच्या आठवणीनी श्रीनाथ बैचेन झाला. आता पहाटवारे वाहू लागलेत. हा चन्दप्रकाश अंब्याच्या घराच्या खिडकीतून अनू, इरा व जनकच्या अंगावरही पडला असेल. हा पहाटवारा त्यांनाही झोंबत असेल. मुलांना दुलईत घेऊन, त्यांच्या अंगावर हात टाकून अनू एकटीच झोपली असेल. त्यांचे श्वास... मिसा कैद्यांचे श्वास ह्या वाऱ्या सोबत एकमेकांकडे मनाची स्पंदनं घेऊन जात असतील का? कुसुमाग्रजांच्या गर्जा जयजयकार मधल्या त्या ओळी सहजपणे श्रीला आठवल्या.
{{center|<poem>श्वासानो जा वायूसंगे ओलांडून भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुलेही या अंधारात
बध्द करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात....</poem>}}
निंबोणीवरची चांदणफुलं आता दिसेनाशी झाली. बारीक बारीक हिरव्याकंच निंबोण्यांचे झुपके पिवळे होऊन गुळचट कडू निंबोण्यांचा सडा पडेल. पहाता पहाता वैशाख संपेल. ग्रीष्माचा दाह सुरु होईल... नि मग येणारा वर्षा ऋतु.
{{gap}}..... पण सर्वांच्या ... मिसावाल्यांच्या मनात कोणता ऋतू असेल? अंधार ऋतू? की न संपणारं 'अंधायुग?'

{{Css image crop
|Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf
|Page = 78
|bSize = 393
|cWidth = 44
|cHeight = 20
|oTop = 509
|oLeft = 311
|Location = right
|Description =
}}<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७8}}</noinclude>
hjhmk214i03cpvxajkthx1bombxm6bq
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/७९
104
70902
155674
2022-08-12T07:02:26Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|{{x-larger|'''७.'''}}}}

{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}

{{gap}}रोज सकाळी वझे आजोबांना 'नवाकाळ' दैनिक अथ पासून इति पर्यंत वाचून दाखवण्याचे काम अंकुशचे असे. आंजाने केलेला चाहा पीत आजोबा सातच्या मराठी बातम्या ऐकत. त्यावर त्यांची स्वतःची मतं ऐकवत. पणजीबाईची..जाणकाक्कांची चाकाची खुर्चीही पावणेसातला जेवणाच्या टेबलाजवळ आंजा आणित असे. मगच गॅसच्या शेगडीवर चहाचे भांडे चढे. आजीबाई... वसुधाताई चहाचे घुटके घेत भाजी निवडत बातम्या ऐकत. सकाळी सहाच्या दिल्लीवरील बातम्यापासून घरात आंजाचा वावर सुरु होई. साडेसहाला अंकुश कोपऱ्यावरून दैनिक नवाकाळ घेवून येई. अंकुशचा चहा वझे कुटुंबातच होत असे.
{{gap}}खरे तर वझे साहेबांच्या घरचे काम न करण्याचे आंजा-अंकुशने ठरवले होते. पण शिवादादांनी हा निर्णय समजुतीने बदलायला लावला. आंजा हुशार आहे. लिहिण्यावाचण्याचा नाद आहे. नव्या घरात गेल्यास तिच्या भविष्याला चांगली दिशा मिळेल. अंकुशलाही दादरच्या कामावर देखरेख करणे सोयीचे होईल. हा शिवादादांचा विचार. आंजा, अंकुश सोनूसह या बंगलीच्या आऊट आऊस मध्ये राहयाला येऊनही आता तीन वर्ष झाली आहेत. आणि अकुंश, आंजा, सोनू या कुटूंबात चांगली रूळली आहेत. वझे साहेबांची मुले वर्षातून एकदा भारतात येऊन जातात. आपल्या घरातील जेष्ठांची... म्हाताऱ्यांची काळजी अगदी घरगुती पध्दतीने घेतली जातेय हे पाहून ती समाधानी आहेत. सोनू या आजी आजोबांच्यात रमली आहे. आंजाने रात्रशाळेत जाऊन दहावीची परीक्षा दिली. त्यात बासष्ट टक्के गुण घेऊन पासही झाली. आजींनी पत्ते खेळायला येणाऱ्या मैत्रिणींना छानपैकी पार्टी देऊन आपला आनंद व्यक्त केला. पणजीबाईंनी आंजाला सुरेखशी साडी आणि सोनूला फ्रॉक आणला. त्यांनी दिलेलं प्रेम आंजाच्या डोळयात मावेनासं होतं. डोळे भरून येतात.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ७९ }}</noinclude>
0uw5qlofvatzzaoutqunhg2y55pdult
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८०
104
70903
155675
2022-08-12T07:07:03Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आभाळाकडे पाहत ती हात जोडते नि म्हणते देवाची करणी माणसा माणसांची जोडणी.
{{gap}}सुरुवातीला आजींनी तिला स्वयंपाक घरातील नवनव्या साधनांची माहिती दिली. स्वच्छता, टापटीप यांचे धडे दिले. पणजीबाई मात्र आंजा अंकुशवर नाराजच होत्या. "माधवा, कोण कुठली माणसं, कोणत्या जातीची हे तरी विचारलंयस का? माझं अर्ध आयुक्ष कोकणातल्या गावात, सोवळं ओवळं पाळण्यात गेलं. मला कळतंय रे माझ्या पांगळीचं करायला माणूस हवंच. सूनबाईची साठी उलटून दोन वरीसं झाली. ती तरी कुठे धावपळ करणार? पण निदान माझ्यापुरती एखादी पोळी करीत जा म्हणावं. नि वरणा भाजीला फोडण्याही घालत जा. त्या पोरी कडून बाकी सगळी उस्तवारी करून घ्यावी. पण गॅस पाशी कशाला ती?..." पणजीबाईंनी काहीशा कडक शब्दांत आपल्या मुलाला... माधवरावांना-आजोबांना फर्माविले. आईचे बोलणे ऐकूण आजोबा हसले.
{{gap}}"आई, माझी सत्तरी जवळ आलीय. या बंगलीत येऊन पस्तिस वर्ष झाली. गेली पंचेचाळीस पन्नासहून अधिक वर्ष मुंबईत वाढलीस तू. तरी अजून सोवळ्या ओवळ्यातच बुडालेली? वसुधा तुझ्यासाठी नक्की चार पोळ्या करील. तू काळजी नको करूस.
{{gap}}आई, सतत तीन वर्षाचा दुष्काळ. शेताला पाणी नाही. हाताला खेड्यातून काम नाही. मागास भाग म्हणून जवळच्या शहरातून काम नाही म्हणून ही माणसं मुंबईत आलीयेत. आठव ना तू जुने दिवस. माझे आजोबा कोकणातले. कोकणातील चार गुठ्यांच्या दोन तुकड्यात भात तो किती पिकणार? ते कोकणातून इथे का आले? माझे तात्याही चाकरमाने बनून इथेच राहिले ना? तुही आमच्या शिक्षणासाठी पावसचा चौसोपी वाडा सोडून गायवाडीच्या दोन खोल्यांच्या चाळीत रमलीस की नाही?
{{gap}}उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरमानी अस तूच शिकवलंस ना आम्हाला? पण गरजेनं आलोना इथं आपण! झालो ना चाकारमान्या मी? तुझी नातवंड भरपूर पैसा पाठवतात. मला पेन्शन मिळतं. पण खायला भात भाजी नि भाकरीच हवी ना?
{{gap}}अंकुश शेतकरी आहे. जातीला काय पाहाचयं? हे बघ चारपैसे जमले की तोही जाईल त्याच्या गावाकडे. शेतात पुरलेलं मन मुंबईत कसं रमेल. दहा एकराचा मालक आहे तो. आणि आपलं म्हणातारपण या पोरांमुळे गार सावलीत निवांतपणे घालवतोय<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८० }}</noinclude>
srm3xtvy01fmugjdw9czizws4tlmjeo
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८१
104
70904
155676
2022-08-12T07:12:03Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आपण. दोन चार वर्ष राहतील. नि जातील माघारी. शेत विकलं नाहीये त्यांनी...!" आजोबांनी आपल्या आईची-पणजीबाईची समजूत घातली. त्यानंतर मात्र या विषयाला कधीच आडवाटा फुटल्या नाहीत.
{{gap}}त्या दिवशी सकाळच्या बातम्यांत इंदिराजींनी देशात आणीबाणी जाहीर केल्याचे कळले. आणि आजोबा काळजीत पडले. त्यांनी अंकुशला इंग्रजी... मराठी, सर्व वर्तमानपत्रे आणायला कोपऱ्यावर पाठवले. गेल्या पन्नास वर्षातल्या विविध आठवणी मनात उसळू लागल्या. जुने दिवस आठवले. वझे कुटूंबाची पावसला चार गुंठे जमीन आहे त्यात भात शेती होती. जुनं कौलारू ऐसपैस घर. अंगणात बारव. गोड्या पाण्याची. आणि भवताली वीस नारळाची, वीस, सुपारीच, चार हापूस नि दहा पायरी आंब्याची झाडं. कोकम, बदाम, केळी, फणस, चिकू यांची चार दोन झाडं. पण घरात दोन भावांचं खटलं. मोठे सावळाराम. म्हणजे आजोबांचे वडिल. त्यांना अरविंद आणि माधव अशी दोन मुले. धाकटे शिवराम त्यांना चार मुली आणि एक मुलगा. घरात माघारी आलेली सोवळी बहिण भागिरथी. दहापंधरा जणाचं कुटूंब, दोहो वेळेला भाजी भाताची सोय होणे अवघड जाई. खाडी ओलांडून रत्नागिरीस जावे लागे. कधी कधी तर घरात आंबे सडून जात. पण रत्नागिरीस पाठवण्याची सोय होत नसे. एक दिवस सावळारामाने मुंबईचा रस्ता धरला. रत्नागिरीस मामाच्या घरी राहून तो चार बुकं शिकला होता. गणितात तरबेज होता. मुंबईत कापड गिरणीत कारकुनाची नोकरी मिळाली. त्याची पत्नी जानकी शेतीकामात हुशार होती. भाताची लावणी पध्दतशीर करी. पोहे करण्याचे कसब तिला होते. कोकमाची अमसुले तर तिनेच करावीत. सावळाराम मुंबईत गेला तेव्हा तिने निक्षून सांगितले होते की ती मुंबईस यायची नाही. तिचा जीव नारळी पोफळीच्या बागेतच पुरलाय. धाकटी जाऊ यशोदा आणि तिचे चांगले मेतकुट जमले होते. घरातील उस्तवारी विधवा नणंद भागीरथी बघे. मग त्या दोघी आंबे, फणस, कोकम यांची उस्तवारी करीत. मुंबईचे चाकरमाने गौरीगणपतीला गावी आले की त्यांचेपाशी आंब्या फणसाच्या पोळ्या, अमसुले, नारळीपाकाच्या वड्या असा सुकामेवा देत. त्यातून मिळणाऱ्या पैशातून पोरांची पुस्तके, कपडे, शाळेची फी थोडीफार निघे. जानकीचा मोठा अरविंद सातवीला गेला. धाकटा माधव आणि यशोदेचा चिंतामणी पाचवीला गेले. मग मात्र सावळारामांनी निक्षून सांगितले की शिक्षणासाठी मुलांना मुंबईस न्यायचे. आणि जानकीने सर्वाच्या<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८१ }}</noinclude>
3e0qghdj4ip7eczacnr0fphv6kr9t8g
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८२
104
70905
155677
2022-08-12T07:14:57Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>जेवनखाण्याच्या सोयीसाठी मुंबईत रहायचे. तशीच तीन वर्षे पुढे ढकलली. माधव व चिंतामणी सातवी फायनल पास झाले.
{{gap}}.... आणि मग पणजीबाई, तेंव्हाची जानकी मुंबईत आली. माधव म्हणजे आताचे आजोबा सत्तरीला आले आहेत. मोठा अरविंदा चार वर्षांपूर्वी देवाघरी गेला. त्याचा बारदाणा पुण्यात असतो.
{{gap}}त्या दिवशी अंकुश संध्याकाळी कामावरून आला, तो थेट आजोबांच्या बैठकीत.
{{gap}}"आजोबा, वातावरण लईच बेक्कार झालंय. आमचं काम चालू असलेल्या बिल्डींगीच्या समोर मधू दंडवते राहतात. तिथे आज पोलिसांची गाडी उभी होती. ताई आणि नाना, दोघेही श्रम करणाऱ्यांच्या हक्कासाठी भांडणारे. बायाबापड्यांच्या अडचणी सोडविणारे. पण पहाना, पकडून नेले त्यांना. खूप गर्दी जमली होती. पण गर्दी न बोलणारी. का त्यांना पकडून नेताय? त्यांचा गुन्हा सांगा मग अंगाला हात लावा... हा विचार प्रत्येकाच्या मनात होता. पण डोक्याच्या बरणीचं झाकण गच्च बंद केलंय बाईनं. अलिकडे नुस्ता संशय आला, एखादा शब्द वावगा बोलला तरी पकडून नेत आहेत, असे आमचे शिवादादा सांगत होते... हे सारं नवीनच. पण हे ऐकुणही मन उदास होतं" अंकुशने आजोबांजवळ मन मोकळं केलं.
{{gap}}बाहेरच्या व्हरांड्यातील बंगईवर बसून आजोबा झोका घेऊ लागले. आणि त्यांचे मन मागे मागे जाऊ लागले. १९४८-४९ चा काळ, आजोबांना... माधवला एका व्यापारी कंपनीत अकाऊंटटची उत्तम नोकरी होती. 'बे एक बे' च्या पाढ्यासारखे सारे कसे सुरळीत चालले होते. ३० जानेवारी १९४८ ला सायंकाळी महात्मा गांधीजींची प्रार्थना सुरु असतांना, नथुराम गोडसेनी महात्मा गांधीचा निर्घणपणे खून केला. त्याचे पडसाद भारतभर उमटले, विशेषतः महाराष्ट्रात. सर्वात जास्त परिणाम भोगावे लागले महाराष्ट्रातील ब्राम्हण समाजाला. त्यातही कोकणस्थ ब्राम्हण समाजाला. ती काळ लाट माधवलाही धडक देऊन गेली.
{{gap}}माधव लहानपणी संघाच्या शाखेत जात असे. त्यावेळी गायवाडीतल्या चाळीत त्यांचे बिऱ्हाड होते. दसऱ्याच्या दिवशी गिरगावातून भल्या सकाळी प्रभात मिरवणूक प्रमुख रस्त्यावरून निघे. सुरवातीच्या बँड पथकात ड्रम वाजवण्याचे काम माधव हौसेने करी. महाविद्यालयात गेल्यावर त्याचा मित्र परिवार रूंदावला. विविध जाती<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८२ }}</noinclude>
h9vgn186l71wk5u8w6aidmtluy1eg3s
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८३
104
70906
155678
2022-08-12T07:18:37Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>जमातीच्या, विविध प्रांतातून आलेल्या विद्यार्थ्यांशी दोस्ती जमली. बेचाळीसच्या 'भारत छोडो' चळवळीत त्याचे अनेक मित्र सहभागी झाले. परंतु चळवळीत उतरण्याचे धाडस माधवमध्ये नव्हते. चार वर्षापूर्वी वसुधाशी त्याचा विवाह झाला होता. तरीही महत्वाचे निरोप पोचवणे, वेष बदलून भूमीगतपणे काम करणाऱ्यांना काका, मामा बनवून घरी सुरक्षित ठेवणे, अशी कामे तो बिनबोभाट करी. १९४८ च्या फेब्रुवारीत अचानक पोलिस आले आणि माधवला घेऊन गेले. परंतु काँग्रेसमध्ये असलेले गणेश श्रीवास्तव, यशवंत गायकवाड या पुढारी मित्रांना कळताच त्यांनी भरारा चक्रे फिरवली. आठ दिवसाचा तुरुंगवास भोगून तो घरी परतला. तेव्हा मोठा विवेक चार वर्षांचा होता तर धाकट्या नरेंद्राच्या वेळी वसुधा गर्भवती होती.
{{gap}}२७ वर्षापूर्वीचा तुरूंगवास आठवून आजोबा अस्वस्थ झाले. 'वसुधा १९४८ ची आठवण आहे ना? डॉ.राम मनोहर लोहिया बाईला गूंगी गुडिया म्हणत असत. पण हाती सत्ता आल्यावर 'ही मुकी बाहुली' भलतीच दौडायला लागलीये. ती काय पावलं उचलील याचा अंदाज बांधणं कठीण आहे... 'हरी ओम तत्-सत्' असे म्हणत ते आतल्या खोलीत गेले.
{{gap}}सोनूला शाळेत सोडण्यासाठी आंजा गेली तेव्हा लाऊडस्पीकर 'माँ तेरे बीसों सपने साकार करेंगे हम' हे गाणे कर्कश आवाजात गात होता. अलिकडे सोनू हेच गाणे बडबडत असते. अशात प्रश्नही खूप विचारते. परवाच आजोबांना विचारत होती की माँ म्हणजे आईच ना? त्यांनी हो, म्हणताच सोनु आंजा जवळ आली आणि प्रश्न केला "मम्मी तुझी वीस स्वप्नं कोणती? आणि स्वप्नं म्हणजे काय गं?" अंकुश, आजोबा, आजी सगळेच तिच्या प्रश्नावर खूप हसले. लगेच दुसऱ्या दिवशी नवी माहिती तिने पुरवली होती.
{{gap}}'माँ म्हणजे आपल्या भारत देशाची आई. पंतप्रधान इंदिरा गांधी, त्यांची वीस स्वप्ने आम्ही मुलांनी साकार करायचीत. असं मीना दिदी म्हणतात.'
{{gap}}आजकाल जिकडे तिकडे हेच गाणं वाजतं. मग समारंभ सार्वजनिक सत्यनारायणाचा असो वा मौंज. बँडवालेही हेच गाणं दणादण वाजवणार. आंजा सोनूला शाळेत सोडून येतांना तिथल्या पालकांना थांबायला केलेल्या खोलीतील वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके चाळत असे. अशात, वर्तमान पत्रांतून येणाऱ्या मोर्चे, घेराव, उपोषण, सत्याग्रह इत्यादींच्या बातम्या येईनाशा झाल्यात. नजर खेचून घेईल असा मजकूरच<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८३ }}</noinclude>
8pyxb1loha5ahdmjuje0fom03d20r2k
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८४
104
70907
155679
2022-08-12T07:21:24Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>नसतो. जिकडे तिकडे स्वयंशासनाचा घोष. आणि, 'इंदिरा इज इंडीया' नारा. सायनच्या झोपडपट्टीत शारदाताई नेहमी येत. त्यांच्या संघटनेचे कार्यालय रेल्वेचा पूल ओलांडून पूर्वेकडे गेले की लागते. त्यांना भेटावसं वाटतं. पण वेळ कसा काढावा? घरात काम नसले तरी आंजा सतत समोर असणे आवश्यक झाले आहे.
{{gap}}एका सकाळी एक गृहस्थ लाल दिव्याच्या गाडीतून अचानकपणे आजोबांची... माधवराव वझेंची चौकशी करीत आले. त्यांच्यासाठी चहा करतांना त्यांचे बोलणेही अंधुकपणे ऐकू येत होते. संघाच्या कार्यक्रमांना आजोबा जातात का? गुरुदक्षिणा निधी किती देतात? अशा चौकशा करीत होते. घराबाहेर पडतांना त्यांनी आजोबांना निक्षून सांगितले, "आबा, तुम्ही मला ओळखले नाही मी विवेकचा जिगरी दोस्त. मोहन जाधव. गुप्तहेर खात्यात अधिकारी आहे. गांधी खून खटल्याचे काळात तुम्हाला अटक झाल्याचे रेकॉर्ड आहे. सर्व जुनी रेकॉर्डस धूळ झटकून उघडली जात आहेत. काळजी करू नका. मी आहेच. पण कोणत्याही सार्वजनिक सभांना जात जाऊ नका. येतो मी." आणि ते गृहस्थ निघून गेले.
{{gap}}ते बोलणे ऐकून आंजाला प्रश्न पडला संघ म्हणजे काय? इतिहासात तिने 'बुध्दं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघ शरण गच्छामि' ही प्रार्थना ऐकली आहे. तो संघ महात्मा गौतम बुध्दाचा संघ जगात शांती यावी, दुःख समाजापासून दूर रहावे यासाठी प्रयत्न करणान्यांचा समुदाय होता. मग हा संघ कोणता... हा समुदाय कोणता? मराठवाड्यातील खेड्यात वाढलेल्या आंज्याला हा नवा 'संघ' माहित नव्हता... तिने मनातले विचार दूर ढकलले. आणि कणिक तिंबू लागली.
{{gap}}अंकुश रात्री उशीरानेच घरी आला. गावाकडून गोविंददादा आले होते. त्यांनी श्रीभैय्यांनाही अटक झाल्याची खबरआणली होती. त्यांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवलंय. बीड जिल्ह्यातले ऐंशी-ब्याऐंशी लोक तिथे आहेत. पंधरावीस जण येरोड्यात... पुण्याजवळ आहेत. हे ऐकून आंज्याला गोंविददादांना भेटावेसे वाटले. त्यांना भेटायचे तर सोनूचे पप्पा काम करतात तिथे जायला हवे. उद्या तिला शाळेतून सोडून येतांना शारदाताईंच्या कार्यालयात जाऊन यायचे असे तिच्या मनाने ठरवले. सकाळी आजीची परवानगी काढायचे लक्षात ठेवले अंकुशला तिने जतावून सांगितले की ती येईपर्यंत दादांना थांबवून घ्यायचे. गेल्या चार वर्षात गावाकडे जाणे जमले नव्हते. आंज्याला सगळ्यांना खूप-खूप भेटावेसे वाटत होते पण....
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८४ }}</noinclude>
miqnp7lcge50ougfnhetbjyjjdiwjiw
पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८५
104
70908
155680
2022-08-12T07:24:34Z
अश्विनीलेले
3813
/* मुद्रितशोधन */
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}..... निळावंतीचा डोह आता तुडुंब भरून वाहत असेल का? दगडवाडीतल्या तरूण सुनांना अजूनही डोंगर उतारावरून उतरूण पाणी भरावे लागत असेल? मध्यात असलेला तो घागर टेकून दम घ्यायला देणारा टेकाचा दगड तसाच असेल? लाकुडफाटा बायांनीच गोळा करायचा. गवऱ्यासाठी शेण साठवायचं. गवऱ्या थापून त्यांची चवड रचायची. पाऊस जवळ आला की पांढरी माती, शेण कालवून त्या उतरंडीवर दाट लेप द्यायचा. मग भर पावसातही एका बाजूने गवऱ्या अलगदपणे खालून काढता येतात. त्या कोरड्या पण रहातात. भाकरी भाजणार बायाच. झाडझूड करणार त्याच. पहाटे शुक्राची चांदणी लुकलुकायला लागली की बाईचा दिवस सुरु व्हायचा तो थेट अंधार गुडूप होई पर्यंत. अंजाच्या डोळ्यासमोर कोरडी ठण्णं निळाई, दगड गोट्यांनी भरलेला दगडवाडीचा वैराण माळ, त्यांचे उतारावरचे भरड रान आले. एखादा एकराला जरी पाणी मिळाले असते तर कशाला जावे लागले असते इथे? पण पाच सालांपूर्वी इथे आलो म्हणून आज, पायाने अधू असलेल्या काकांना अंकुश वेळेवर पैसे पाठवू शकतो. जमीन पडिक राहिली तरी जागेवरच आहे. माणसांच्या अडचणी केवळ पैशानेच दूर व्हायच्या का? आणि सुखसोयी सुध्दा पैशानेच मिळवायच्या?.... आंजाच्या मनात विचारांचं जाळं झालं होतं ते झटकून ती अंकुशच्या कामाच्या ठिकाणी निघाली. पण आंजा कामाच्या जागी पोचण्याआधीच अंकुश तिला वाटेत भेटला त्याने तिला माघारी फिरवले. तो आणि शिवादादा श्रीभैय्यांना भेटायला गोविंददादासोबत नाशिकला जाणार होते. अंकुश गोविंददादांबरोबर पुढे चार दिवस गांवी जाऊन येणार होता.

{{gap}}नाशिक रोडवरचा ऐसपैस पसरलेला तो निर्विकार तुरुंग. कित्येक वर्षांपासून मख्खपणे उभा आहे. भारतातील मध्यवर्ती तुरुंगापैकी हा एक. आत मुख्य लोखंडी दरवाजातून शिरले की लिंबोणी, वड यांची काही डेरेदार झाडं दिसतात. मग क्षणभर हायसे वाटते. मध्यात दगडी इमारत. व्हरांड्याला गजाळ्यांची भक्कम उभी जाळी. बाहेर तासभर थांबल्यावर मधल्या आवाराच्या पायऱ्या चढून, मधल्या कॅरीडोर मधून श्रीभैय्या येतांना दिसले. मागे अमन, अशोक, अण्ण्याही होते. भेटणाऱ्यांच्या यादीत अंकुशचेही नाव होते. तो आंब्याला थांबेलच असा विचार करून सगळ्यांनी घरी द्यायला चिठ्ठया आणल्या होत्या.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८५ }}</noinclude>
n030gv4w5q2tezszgf17bz9d0y0b763