विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk साचा:Collaboration 10 256 155681 155663 2022-08-12T12:09:08Z QueerEcofeminist 918 "[[साचा:Collaboration]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) wikitext text/x-wiki {| width="100%" border="0" cellspacing="0" cellpadding="5" | width="100%" style="font-family: Verdana, Arial, Helvetica, sans-serif; " | *[[सहाय्य:परिचय|विकिस्रोत परिचय]] *[[विकिस्रोत:नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎|नवीन सदस्यांना मार्गदर्शन‎]] *[[विकिस्रोत:मुख्य चर्चा पान|मुख्य चर्चा पान]] *[[विकिस्रोत:समुदाय दालन|समुदाय दालन]] *[[सहाय्य:आशय|साहाय्य]] *[[विकिस्रोत:प्रताधिकार माहिती|प्रताधिकार माहिती]] *[[विकिस्रोत:प्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता|प्रताधिकाराचे उल्लंघन होण्याची शक्यता]] |} 🙝🙟 ====समुदायास विनंत्या/कौल==== * [[विकिस्रोत:कौल/Bot|कौल/Bot]] * [[विकिस्रोत:कौल/प्रचालक|कौल/प्रचालक]] * [[विकिस्रोत:चावडी/प्रचालकांना निवेदन|चावडी/प्रचालकांना निवेदन]] * [[विकिस्रोत:प्रगत अधिकार|विकिस्रोत:प्रगत अधिकार]]
4k15751axos5cu03ltrnis8bbthhevf साचा:Username Change 10 70839 155692 155625 2022-08-12T17:23:47Z QueerEcofeminist 918 "[[साचा:Username Change]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) wikitext text/x-wiki

[[file:Global renamer-logo.svg|75px|link=[[m:Global rename policy]]]]

तुमचे सदस्यनाव विकिमिडीया मधील काही मुख्य(इंग्रजी विकिपिडीया, विकिकॉमन्स इ.) प्रकल्पांच्या धोरणात बसत नाही, तसेच ते विकिमिडीया [[M:Terms_of_use#4._Refraining_from_Certain_Activities|टर्म ऑफ युजच्याही]] विरुद्ध जाते. विकिपीडियाचे सदस्यनाव वैश्विक असल्यामुळे तुम्हांला तुमचे नाव बदलण्याची विनंती केली जात आहे. सदस्यनाव न बदलल्यास तुम्हाला कायमचे ब्लॉक/तडीपार केले जाऊ शकते.

सदस्यनावात वैश्विक बदल करण्याची विनंती करण्याची माहिती [[विकिस्त्रोत:सदस्यनाव बदला]] येथे देण्यात आली आहे! या पानावरील माहिती लक्षात घेऊन [[विशेष:GlobalRenameRequest|येथे दिलेल्या दुव्यांवर]] जाऊन सदस्यनावात बदल करण्यासाठी अर्ज करू शकता. सदस्यनाव शक्यतो हलके फुलके व कोणत्याही प्रकारे कोणालाच दुखावणारे किंवा गैर वाटेल असे नसावे. जाहिरातबाजी, अश्लिल, अपमानकारक, पदे/सत्ता दर्शवणारे असे कोणत्याही प्रकारचे नाव नसावे.

f7gfo9xueho3qm4o3mclve82jefdixe पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८६ 104 70909 155682 2022-08-12T15:31:42Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}".... मात्र गोविंददादा आमच्यासाठी भरपूर पुस्तकं पाठवा. आणि पुढच्यावेळी याल तेव्हा ठाणवाईच्या डोंगरातला मेवा आणा. हापुस पायरीपेक्षा आपल्या भागातले आंबे नक्कीच चवदार आहेत. श्रीनाथने गोविंददादाना हसत सांगितले आणि तो उठला. तासभर कसा आणि कुठे गेला कळले नाही. निघतांना मन कसनुसं झालं. सर्वांना डोळयात भरून घेवून अंकुश, गोविंददादा बाहेर पडले. नासिक भेटीत गोदावरीत दोन बुचकळ्या माराव्यात. काळा राम-गोरा राम मंदिरे पाहावीत. नारोशंकराच्या प्रचंड घंटेला हात लावावा असे मनात होते. गोविंद दादांनीही हाच बेत केला होता. तिघांनी गंगेजवळच्या धर्मशाळेत मुक्काम ठोकला.
{{gap}}"अंकुशा आपन खेड्यातली मानसं. द्येवाला हात जोडणारी. ज्ञानीसर, तुकाराम यांनी सांगितलं, तसं वागनारी. भजन, पोथ्यात रमनारी. अव द्येव हाय की नाय ह्ये त्योच जानं. पण दुष्काळ पडला तवा आठवलं कोन? द्येवच ना? हितवर आलाव तसं नासिक पाहू आन् तिरबंकेसरलापन जाऊन येऊ व्हय?" शिवादादा गोविंददादांच्या मनातलंच बोलले. "आरं आमच्या शिरीभैय्याच्या घरात द्येव वगैरे न्हाई. ते देवाला जात नसले तरी द्येवाला मानणाऱ्यानांबी मान देतात. वैनी तर तुकाराम ज्ञानेसरांच्या पोथ्यांचा अभ्यास करतात. पोरांना शिकिवतात. त्यांच येकच म्हणनं. की बामण आन् पुजारी द्येवाच्या नावावर पैका उकळतात. अडानी साध्या लोकाले फशिवतात ते चांगलं नाही." गोविंददादांनी त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. दुसऱ्या दिवशी शिवादादा मुंबईला परतले. अंकुश आणि गोविंददादा सकाळच्या नासिक लातूर एस.टी.बसने आंब्याला जायला निघाले.
{{gap}}फेब्रुवारी संपला आहे. वसंत ऋतुची चाहूल यंदा अनेक वर्षांनी लागली आहे. सुगंधी हवा जोगाई मुकुंदराजाच्या डोंगरात घुमू लागलीच गेल्या साली बऱ्याच वर्षांनी पाऊस बरा झालाय. घोडदऱ्यातून पडणाऱ्या पाण्याची धार आता रोडावली असली तरी पाणी पडते आहे. निळी पिवळी फुलं कडेनं उगवली आहेत. ठाणवाईच्या डोंगरातल्या आंब्यावरचा मोहोर चहूअंगानी बहरला आहे. अंकुशने आंब्याला उरतांनाच ठरवले होते की गावाकडे ...दगडवाडीला चालत जायचे. सर्वांना भेटत जायचे. अंकुश अनूवहिनींना प्रथमच भेटत होता. जातांना त्याने जनक ईरासाठी दोन बिस्किटांचे पुडे घेतले. वहिनीजवळ सर्वांनी नातलगांना दिलेली पत्रे दिली. काकास शर्ट, पायजम्याची जोडी, पांघरायला सोलापुरी चादर या लागणाऱ्या वस्तू घेतल्या.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८६ }}</noinclude> 9y0x93iqqutcqodfw2cma1b3tj54qos पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८७ 104 70910 155683 2022-08-12T15:35:03Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>काकांना भाकऱ्या करून खाऊ घालणाऱ्या गंगूमावशीच्या नातीसाठी बिस्किट पुडा घेतला. योगेश्वरीचे दर्शन घेऊन तो वाट चालू लागला. माथ्यावर उभ्या असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात तो शिरला. दगडवाडी अल्याडच्या वाघाळपिंपळ्यांचे बुधाजीअण्णा गळ्यात विणा अडकवून भजन गात होते. पहारा देत होते. मंदिरापलिकडच्या भागातून पखवाज घुमवल्याचा आवाज आला आणि त्याचे पाय थबकले. तो आठवित होता. तेव्हा त्याच्या बाप्पांची इच्छा होती त्याला कीर्तन शाळेत घालण्याची. अंकुशचा गळा मधुर होता. तो भजन सुरेखपणे गाई. पण खूप खूप शिकण्याची ओढ असलेल्या अंकुशने त्यांची इच्छा दूर ठेवली. आज मात्र क्षणभर त्याला वाटून गेले की, बाप्पांचे ऐकले असते तर पोट भरण्यासाठी घर, जमीन, म्हातारे.... लंगडे काका यांना सोडून मुंबई गाठावी लागली नसती. त्याचे पाय आपोआप मंदिराकडे वळले. दर्शन घेतांना आपल्या परिसरात आल्याची निवांत तृप्ती त्याला सुखावून गेली. आणि तो पायऱ्या उतरून खालच्या पटांगणात आला. तिथे पखवाज शिकणारी मुले, मुक्कामाला आलेले वारकरी रहातात. मधोमध मोठे खुले सभागृह होते. तिथे शंकरअण्णा सारोळकर मुलांना घेऊन पखवाज वाजवीत होते. ते सारे दृश्य त्याने मनभरून पाहून घेतले आणि अण्णांना दंडवत घालून तो बाहेर आला. व डोंगर उतरू लागला. डोंगराचा उतार उतरून तो जयवंती, वैनगंगेच्या संगमाजवळ आला. पल्याड जाणारा पुल पार उखडून गेलाय. चपला हातात घेवून त्याने पाण्यात पाय बुडविले. वाळूतून चालायला सुरुवात केली. मन लंगड्या काकांना, गावातल्या संवगड्यांना भेटायला खूप आतुर झाले होते. दादरचे वझे कुटुंब मुंबईतल्या गोष्टी सारे मागे-मागे पडत गेले. त्याने मनात पक्के ठरविले. पैसे साठवायचे. विहिर खणायची आणि आंज्या, सोनूला घेऊन परत आपल्या गावात यायचे. बेत रंगवित तो डोंगरातल्या रस्त्याचा चढ चढू लागला.
{{Css image crop |Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf |Page = 87 |bSize = 392 |cWidth = 38 |cHeight = 21 |oTop = 452 |oLeft = 311 |Location = right |Description = }}<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८७ }}</noinclude> 7isvdno8v54vq4jbyaxt97uf3rafpqx पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८८ 104 70911 155684 2022-08-12T15:39:05Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{x-larger|'''८.'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}"अशात बाई नि काकाजींना खूप खूप पहावसं वाटतं. कसे आहेत ते? मोठ्या घरी गेली होतीस? नि गावाकडे? त्यांनाही माझी आठवण येतच असेल. विचारतात? मी मात्र घर, गाव आठवलं की 'माओ' च्या क्रांतीची पुस्तकं काढून बसतो. तोच घुसलाय मनात. अर्थात् त्याची बेदरकार हुकुमशाही कधीच न पटणारी. पण त्याच्या कवितेतील त्या ओळी. मनाच्या तारा सतत झणकारीत फिरतात. {{center|<poem>Go to the people live with them, love them learn from them what they know & build on what they have..."</poem>}} {{gap}}लोकांच्यात जाऊन मिसळा. त्यांच्यातले होऊन रहा. त्यांच्यावर प्रेम करा. त्यांच्या अनुभवातून साचलेले शहाणपण वेचून घ्या. आणि त्यांच्याजवळ जे आहे त्यातूनच त्यांच्या सुखाची वाट शोधा... नवनिर्माण करा.
{{gap}}आपण आजवर अनेक मोर्चे काढले. पण कोणाच्या जीवावर? आमच्या विश्वासावर हजारो माणसे... स्त्रीपुरुष... डोंगर तुडवित, पायी, उपासपोटी मोर्चात सामिल झाली, घसा फुटेस्तो घोषणा दिल्या. पण आम्ही... आपण काय दिलं त्यांना? न पेरता येणारी, न उगवणारी वांझोटी स्वप्नं? ...? फाटलेल्या, उजाड जमीनीचे, थेंबभर पाण्यावाचून तरसण्याचे वास्तव? हे कधी नि कसे बदलणार? कोण बदलणार? कधी?... केव्हा?....
{{gap}}अनू, ही अंधारयात्रा संपली ना तर त्या उजाड डोंगरभागात जायचा, नि गाडून घ्यायचा विचार आहे. तेथील दीडदोन एकरावाल्या शेतकन्यांची कोरडीठण्ण तहानलेली जमीन त्यावर उगवलेली पांढुरक्या निःसत्व झुडपांची गर्दी जमीन अधीकच बंजर<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८८ }}</noinclude> flpy1qrqsde9i1vsc1k4ntzto0jzrn5 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/८९ 104 70912 155685 2022-08-12T15:43:05Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>करणारी या तहानलेल्या मातीचे उजाड कोरडे डोळे आणि उत्तरेतल्या नद्यांचे पूर ...वाहून जाणारी माणसे, जमीन सतत स्वप्नात येतात. ते पाणी तर आपल्या भागात येणे अशक्यच पण आपल्या भागातल्या कोरड्या विहिरी कधी भरणार? जीवघेणा दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलाय का? पण हे 'अंधारयुग' संपणार आहे ना? ते बाईच जाणे आणि नियती जाणे!
{{gap}}आता सारचे मिसा कैदी कंटाळले आहेत. शासनाने एक नवा रेशमी फास टाकला आहे. अनेक जण त्यांत अडकत आहेत. मिसाकैद्याने लिहून द्यायचे की, 'मी गैरसमजुतीने आणीबाणीला विरोध केला. मला अनुशासन मान्य आहे.' लिहा आणि सुटा. कधीतरी केव्हातरी लहानपणी शाखेत गेलेली माणसं. कधी मोर्चात वा मिरवणुकीत मिरवली असतील वा दसऱ्याच्या बँडपथकात ढोल बडवला असेल. पण मुळात सारीच माणसे साधीसुधी आणि संसारमग्न. ती या फतव्यात अडकली. युक्रांद, समाजवादी यात फारसे अडकणार नाहीत याची शासनाला कल्पना होतीच. म्हणून त्यांच्या गटावर सुरवातीला फासा टाकला तो काडी पैलवान वैजनाथ आणि आपल्या नरहरी अण्णांवर. स्वभावाने आणि परिस्थितीने गरीब. न शिकलेले. पण ते काय बधतात? खरे वीर तेच. त्या दिवशीच्या सायंकाळच्या बौद्धिकात बापूंनी कणखर पण गदगदलेल्या आवाजात आम्हा सर्वांच्याच मनातली कृतज्ञता नोंदवली. 'एके काळी मला एस्सेमकडून प्रेरणा मिळाली होती. पण वैजनाथ, नरहरीअण्णा, आज मात्र माझ्या निराशेने पिचलेल्या मनाला तुमच्याकडून प्रेरणा मिळाली आहे.'
{{gap}}गेल्या चार दिवसात बारा जणांना चारचार दिवसांचा पॅरोल मिळालाय. मीही अर्ज केलाय. बघू. पण आजकाल बाहेरची बसंती हवा इथवर पोचू लागलीय. तुम्ही सगळे मला भेटता. बकील भाईंच्या पत्नी - भाभीजी, श्रीकांत दादा येतात. भेटून जातात. पण गांव, त्यातले रस्ते, माणसं, ओळखीची घरं... गल्ल्या... परिसर. यांनाही पहावेसे वाटते. 'माणदेशी माणसं' शिकवतांना साधुगुरुजी सांगत की गावालाही चेहेरा असतो. आज पटतंय ते...बाई नि काकाजींची खूप खूप आठवण येते. त्यांना प्रणाम. ईरा जनकला आशिर्वाद.
{{gap}}खूप खरडतोय मी. कंटाळलीस? थांबतो इथेच."
{{gap}}श्रीनाथने पत्र बंद केले. आणि अमनकडे टाकायला देण्यासाठी तो खोलीच्या बाहेर आला.
{{gap}}आज अमन, बन्सीधर, अशोक यांच्या पोटात आणि छातीत दुखणार आहे.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ८९ }}</noinclude> d66n02azr3dn8g3upud7ol15ge8l8hl पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९० 104 70913 155686 2022-08-12T15:46:52Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>गेल्या काही दिवसांपासून दगडीभिंतीही जरा सैलावल्या आहेत. जुने कैदी, अधिकारी, हापपोलिस यांच्याशी मैत्र जुळू लागलेय. ज्यांची प्रकृती बिघडलीय अशांना पोलिस व्हॅन मधून नाशकातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेतात. अर्थात आजकाल सगळेच अधूनमधून आजारी पडतात, मग पोस्टात पत्रं टाकणं, चिठ्याचपाट्यांची देवाण घेवाण, भेटीगाठीसुध्दा सारे काही जमके घडते. जणु ते काही तास वसंतवर्षा ऋतुचे. वाट पाहायला लावणारे. आणि पहाता पहाता संपणारे. गजाआडच्या दिवसारात्रीचीही सवय झालीय सर्वांना. श्रीनाथ ग्रंथालयाजवळच्या लिंबाच्या झाडाखाली येऊन बसला. मनात विचारांचे भुईचक्र दहा दिशांनी फिरत होते.
{{gap}}जेलमध्ये येऊन साडेतेरा महिने झालेत. अनूच्या पत्रात तिच्या मराठवाड्याच्या रविवार पुरवणीत प्रकाशित झालेल्या लेखाचे कात्रण आहे, 'जा रे बदरा बैरी जा...' ढगांबरोबर पाठवलेला निरोप. प्रेम...विरह...संताप... द्वेष या साऱ्या भावना काळ पुढे वाहत गेला तरी ताज्या टवटवीत राहणाऱ्या असतात. परवा उदगीरचा रघुवीर पाटील सांगत होता त्याच्या धाकट्या अनिकेतने आईजवळ हट्टच धरला. कॅलेंडर मधल्या त्या बाबांना पकडून नेणाऱ्या बाईला गोळ्या घालायला बंदूक आणून दे म्हणून. "माँ तेरे बीसो सपने साकार करेंगे" हे गाणे लागले की ते पाचवर्षाचे पिल्लू कानात बोटे घालते. आरडाओरडा करते.
{{gap}}जेलमध्ये आल्यापासून खूप वाचन झाले. ज्या तत्त्वांसाठी संघर्ष केला त्यांची खोलात जाऊन पुनर्मांडणी करायला लागणारा निवांत एकांत इथे आपतः मिळाला. आपल्या प्रमाणे शेकडो तरूण वेगवेगळ्या गांवातून शासनाच्या चुकीच्या धोरणांविरूध्द संघर्ष करीत आहेत. याची जाणीव खूप बळ देणारी. ती इथेच मिळाली.
{{gap}}पहाता पहाता उन्हें कलली आहेत. आभाळात चारदोन काळे ढग गोळा होऊ लागलेत. वेगवेगळ्या कोपऱ्यात गट जमू लागले आहेत. एका कोपऱ्यात नमाज पडण्याची जागा आहे. तर दुसऱ्या कोपऱ्यात रामरक्षा, हनुमान चालिसा यांचा जप सुरु होई. समाजवादी साम्यवादी मंडळी एका कोपऱ्यात वादविवादांची मैफल जमवीत असतात. सारे कसे अगदी सहजपणे. एका लयीत. एकमेकांना न टोचता न बोचता. एकमेकांच्या वैचारिक भूमिका जाणून घेण्याची उत्सुकताही आपोआप जागी झाली होती. अमन, सुनील यांनी गोळवलकर गुरूजींचा 'बंच ऑफ थॉट्स' वाचण्याचा घाट घालताय. श्रीनाथने माओ, ची गव्हेरा हातवेगळे करून नव्या वैचारिक दिशेचा शोध घेण्याचे ठरवले होते. विवेकानंद, अरबिंदो खुणावत होते.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९० }}</noinclude> d7hbiicf6isvizi3kbzto3yvwkjun1p पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९१ 104 70914 155687 2022-08-12T15:49:45Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}अभाविपचा खंदा कार्यकर्ता प्रवीण, मानवेन्द्रनाथ रॉय यांच्या Reason, Romanticism & Revolution 'कारण क्रांती आणि प्रेरणा' या तीन 'R' मध्ये डुबक्या घेण्याचा प्रयत्न करीत होता. अर्थात आरएसएस, जनसंघ, विहिंप यांच्या वेटोळ्यात अडकलेला सुधीर प्रस्तावनेच्या पल्याड फारसा जाऊ शकला नाही. पण उत्कृष्ट वक्तृत्व, शब्दांवरची पकड आणि भावनांना हात घालणारा ठाम... काहीसा कोरडा आवाज, यांच्या आधारावर तो त्याला न कळलेल्या विषयालाही निर्भिडपणे हात घाली. आणि अशी खुमासदारपणे मांडणी करी की श्रोत्यांनी भारावून जावे. अमनने हे पुस्तक पूर्णपणे पचवले होते. सुधीर त्या दिवशी या डाव्या विचारांची मांडणी करणार होता हीच आगळी बात होती. म्हणून या विषयावर बोलण्याची संधी त्याला एकमताने दिली होती. रोज रात्री एकेकजण अभ्यास विषय मांडीत असे. नंतर प्रश्न विचारले जात. प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने अमन पुढ्यात जाऊन बसला होता. पण प्रविणने कटाक्षाने त्याला टाळले. अमन जाम वैतागला. पण त्याच्या मांडणीमुळे श्रीनाथच्या मनात मानवेन्द्र नाथांचे साहित्य वाचण्याची ओढ मात्र निर्माण झाली.
{{gap}}मार्क्सच्या साम्यवादाच्या मांडणीपेक्षा माओची मांडणी सामान्य आणि मोठ्या संख्येने असणाऱ्या छोटया शेतकऱ्यांना न्याय देणारी, नवी उभारी देणारी ठरेल असे त्याला वाटे. मानवेन्द्र नाथांच्या मांडणीत व्यक्ती आणि तिचे स्वातंत्र्य यांना मध्यवर्ती स्थान होते. समाजविकास साधतांना जर स्वातंत्र्य आणि स्वास्थ्य यांचा प्रत्यक्ष अनुभव सर्वसामान्य व्यक्तीला येत नसेल तर ती प्रगती, ते स्वातंत्र्य भासमय होय. ही त्यांची ठाम आणि मध्यवर्ती भूमिका. त्यांच्या मते आर्थिक लोकशाही आली नाही तर राजकीय लोकशाही खऱ्या अर्थाने प्रस्थापितच होऊच शकत नाही. श्रीनाथने मानवेन्द्रनाथांच्या विचारांकडे वळण्याचे श्रेय मनोमनी सुधीरलाच देऊन टाकले. मानवेन्द्रनाथांची काही पुस्तके अनूला घेऊन येण्यास लिहिण्याचे ठरवले. पत्रही पोस्टात पडले. आणि दुसऱ्या दिवशी जेलर साहेब त्याला चार दिवसांची पॅरोल मिळाल्याची खबर घेऊन आले. ही बातमी ऐकून श्रीनाथ गोंधळून गेला. गेल्या चौदा महिन्यात एस्टीचे दर्शनही झालेले नव्हते. शिवाय इथून निघायचे म्हणजे उद्या सकाळी? त्याने भिंतीवरच्या घड्याळात पाहिले सकाळचे नऊ वाजलेले. नाशिकडून अंब्याला जाणारी एस्टी एकच. ती सकाळी सहालाच निघून गेली असणार. क्षणभर वाटले इथेच फतकल मारून बसावे. लोळावे. त्या एस्ट्या बदला.. बारा तासांचा प्रवास... जीव टोकदार सुईवर तोलावा तसेच काहीसे. एवढ्यात अमन दिसला. त्याच्यापर्यंत बातमी पोचली होती. त्याची बडबड सुरु झाली.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९१ }}</noinclude> pr45y6xytg17jgxnkwotgfnm7xl9nly पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९२ 104 70915 155688 2022-08-12T15:53:42Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"श्रीभैय्या, उठा. करा तयारी. इथून भत्ता खाऊन सरळ नगरची एसटी पकडा. तिथून पुणे-अंबाजोगाई, नगर-अंबाजोगाई गाडी मिळेल नाही तर जामखेड, पाटोदा असं टल्ले मारीत जायचं. गावाकडे जायला मिळतंय राव! आटपा लवकर... आमच्या सर्वांच्या घरी जाऊन या बरका. लई याद येते राव अम्मी-अब्बांची नि आंब्याची. नरहरी आण्णा पत्र लिहायला बसलेत सुध्दा!
{{gap}}नागपूर, अमरावती, नगर, महाडच्या सहाजणांना चार दिवसाचा पॅरोल मंजूर झाला होता. दुपारी दोन वाजता नगरकडे जाणारी एसटी पकडण्यासाठी दीडलाच सगळे पोलिसव्हॅन मधून एसटीस्टँडकडे रवाना झाले. निघतांना श्रीनाथने कैद्यांनी तयार केलेली एक शबनम विकत घेतली. त्यात भरण्यासारखे सामान तरी कुठे होते? होती पुस्तकं. ती नीट ठेवून तो निघाला इतक्यात मालेगावच्या युनूसभाईचा ॲटेंडट... कैदीसेवक जवळ आला. आणि न चुकता तंबाखूची पुडी व चुन्याची डबी शबनममध्ये टाकली.
{{gap}}"दादा, आजवर मी बोललू नाय. मी केजा जवळच्या उंदरीचा हाय, भीमा पांचाळ माजं नाव. पांच सालापूर्वी बायकूच्या डोस्क्यात दगुड घालून मारलं म्हणून जलमठेप भोगतुया. तवा लेकरं न्हान होती. आठ वरसाचा ग्यानू आन् सहा वरसाची चंदरभागा. अंगावर पिती भीमा खरचली म्हणं मायच्या दुदुविना. लेकरं बगून या. जमल का? डोस्कीत लई राग व्हता. जेऊ खाऊ घालणारनीला मारून टाकलं. लई पच्चाताप हुतो. पण काय उपेग? लेकरं मामा संबाळतो. तो आंब्या लगटच्या चनईत ऱ्हातो. त्याला बी माजी माफी सांगा. लेकराचे फोटू बी जमलं तर आना." दादाराव बोलता बोलता रडू लागला. त्याला मुलांना भेटण्याचे आश्वासन देऊन श्रीनाथ मेन गेटमधून बाहेर पडला. व्हॅन स्टँडमध्ये पोचली तर समोर नगरगाडी लागलेली. श्रीनाथ, नगरचा विजय पाथरे घाईने बसमध्ये चढले. गाडी खचाखच भरलेली होती. कुण्या एका सुजाण माणसाने, बरोबरचे पोलिस या दोघांच्या चेहऱ्यावरचा, शिक्षण, निर्भयता, ठामपणा यांच्या मिश्रणातून झळकणार करारी भाव पाहून त्याचे राजकीय मिसापण ओळखले. 'आओ बंधू आओ. यहा बैठ जाईये. मुझे अगले स्टॉपपेही उतरना है'. असे म्हणत बसायला जागा दिली. शेजारच्या माणसाच्या कानात सांगितले,
{{gap}}'अरे, ये तो नासिक जेल से पॅरोलपर घर जानेवाले मिसाबंदी लगते है. पढ़े लिखे दिखते है, हम इमर्जन्सी के खिलाफ लड तो नही सकते, जो लड रहे है उनकी इज्जत<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९२ }}</noinclude> q0frdr28bm0gwctp98y5a4a375eoqcu पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९३ 104 70916 155689 2022-08-12T15:58:25Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>तो करेंगे. बैठने दो भैय्या इनको. दोघांना जागा तर मिळालीच पण पावसाळी थंड हवेत आद्रक घातलेला चहा पण त्या अनामिकाने पाजवला.
{{gap}}एसटी नगरला पोचली तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. विजयने घरी चलण्याचा आग्रह केला. पण जाण्याचा मूड नव्हता. श्रीनाथने बाहेर चक्कर मारली. एखादे केशकर्तनालय सापडते का याचा शोध घेतला. पण दुकान सापडलं नाही. पोटात इडली सांबर ढकलून तो पुणे अंबाजोगाई बसची वाट पाहू लागला. पुण्याहून रात्री नऊ वाजता निघणारी बस पाऊस पाण्यामुळे उशीरा आली. तो गाडीत शिरला तेव्हा रात्रीचे दोन वाजले होते. पण बस रिकामी होती. तीन सीटच्या बाकावर तो एकटा. श्रीनाथने सुखावून डोळे मिटले......
{{gap}}एक गचका देऊन 'यश्टीमाय'... एस.टी. थांबली. त्या गचक्याने श्रीनाथ जागा झाला. जामखेड आले होते. श्रीने घड्याळात पाहिले. लहानकाटा चारच्या थोडापुढे सरकला होता. तोंडावर पाण्याचा शिपका मारावा या हेतूने तो सीटवरून उतरण्यासाठी उठला. हात वर ताणून गेल्या चौदा महिन्यांतला आळस झडझडून झटकून टाकला. इतक्यात त्याच्या कानावर हाक आली, "श्रीभैय्या, चला च्या प्यायला. ओळखलंत का? मी पिंपळ्याच्या दिनकर कऱ्हाडचा धाकटा भाऊ. तो तुमच्या सोबत काही दिवस होता. 'बदलाव' संघटनेत. माझ नाव अनंता. गेल्या साली ही नोकरी लागली. कंडक्टरची दिनू दादांनी दोन एकर इकून सायबांना 'च्यापानी' केल तेव्हा कुठ नंबर लागला. हिस्ट्री घेऊन एम.ए. झालो आता मारतोय घंटी आणि फडतोय तिकिटं.
{{gap}}भैय्या सुटलात का तुम्ही?" चहाची ऑर्डर देत देत अनंताने प्रश्न केला.
{{gap}}"भैय्या, माफीनामा लिहून दिला की सुटतात म्हणे मिसावाले. बरं झालं लिहून दिलेत ते. अनूवैनींनी तरी लेकरं सांभाळित संसाराचा गाडा किती दिस एकटीनंच ढकलायचा?" अंतूचे बोलणे ऐकूण श्रीनाथ हसला.
{{gap}}'तुला वाटतं अंतू, की तुझा श्रीभैय्या माफीनामा लिहून सुटेल म्हणून? तुरूंगाला घाबरतो होय आपण? शिवाय तुझ्या सारख्या अनेकांची साथ आहे की ! चार दिवस पॅरोलवर सुटलोय. पाचव्या दिवशी पुन्हा नाशिकला मध्यवर्ती कारागृहात जाऊन 'हाजीर है' म्हणायचे!
{{gap}}.... चला, आज आंब्याच्या मित्राचा चहा पिऊन सकाळ उजाडतेय...' अनंताच्या पाठीवर प्रेमाने थाप मारित श्रीनाथ उठला.
{{gap}}गाडी सुरु झाली. श्रीनाथच्या मनात पुढच्या पन्नास पंचावन्न तासांत कुणाकुणाला<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९३ }}</noinclude> ajreib7dz7w671ho5ieyzkzicou1llq पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९४ 104 70917 155690 2022-08-12T16:04:45Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>भेटायचे, अनू, जनक, इरासाठी जास्तित जास्त वेळ कसा काढायचा याचे चक्र फिरू लागले. अशक्या, अमन, नरहरी अण्णा... अशी अनेक नावं समोर येऊ लागली. विचार करता करता कधी डोळा लागला ते लक्षात आलं नाही. पुणे-परळी रातराणी अंबाजोगाईला स्टँडवर पोचली तेंव्हा आठ वाजून गेले होते. श्रीनाथ एसटीतून उतरून स्टँडच्या बाहेर आला. कितीतरी दिवसांनी ओळखीचा रस्ता, दुकानं, गर्दी पाहत होता. एक दीर्घ श्वास त्याने उरात भरून घेतला आणि उत्साहाने घराच्या दिशेने चालू लागला. एवढ्यात नरहरी अण्णांच्या भाच्याने, पांडबाने त्याला पाहिले.
{{gap}}'अरे! शिरीभैय्या? उस्मान शिरीभैय्या दिसायलेत' असे म्हणत पांडबाने श्रीनाथला गाठलेच. पाठोपाठ उस्मानही आला. 'भैय्या, कैसे हो?' उस्मानने श्री चा हात गच्च दाबत विचारले. "शिरीभैय्या, मामा कसे हायती?' विचारतांनाच पांडबाचे डोळे भरून आले. त्याला जवळ घेत श्रीनाथने त्याला दिलासा दिला.
{{gap}}पांडबा, घरी जाऊन येतोच मी. येताना नरहरी अण्णाचं पत्र आणतो. मामी घरीच आहेत ना? शिवाय दाढी करायलाही येतो. उस्मान माझं पान लावून ठेव हं. आणि आत चिमुटभर जर्दा टाक. चुना एक बोट जास्त... अरे, असे डोळे विस्फारून पाहू नकोस. ही नवी चव, तुझ्या श्रीभैय्यांना 'मिसा' ने लावलीय.' असे म्हणत श्रीनाथ झपझप पावले टाकू लागला.
{{gap}}जिना चढतांनाच मोहितेकाकांनी त्याला पाहिले. आणि ते आंनदाने ओरडले.
{{gap}}'अनू वैनी आधी निरांजनाचं ताट ओवाळायला आणा. सुधे, पैले फसक्लास चहा टाक. नि पुरण चढव गॅसवर, बघा कोण आलंय ते!!!'
{{gap}}अत्यंत प्रेमाने काकांनी श्रीनाथला मिठी मारली.
{{gap}}'माँ, बाबा आले. माँ बाबा....' जनकला, बाबाला पाहून काय बोलावे ते सुचेना. अनू आंघोळीला बसली होती. क्षणभर तीही सैरभैर झाली. चार तांबे अंगावर ओतून ती बाहेर आली. इराने बाबाचा पूर्णपणे ताबा घेतला होता. जनक बाबाला अगदी चिटकून बसला होता.
{{gap}}'श्री? अचानक? तार नाही. रेडीओवरही काही... एकटाच आलास?...' अनूला मध्ये अडवून सुधाताईंनी निरजनाचे ताट अनूच्या समोर धरले. आणि हुकूम केला.
{{gap}}'भावजी आधी दाराबाहेर उभे रहा. मी पायावर पाणी घालते. अनू ओवाळील आणि मग घरात या.'
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९४ }}</noinclude> afodmrptjec2fse6j480ayw69h18qrv पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९५ 104 70918 155691 2022-08-12T16:09:17Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}श्रीनाथ आज्ञाधारकपणे बाहेर जाऊन उभा राहिला. अनूने ओवाळले. पाण्याने डबडबलेले डोळे पुसताना तिची त्रेधा उडाली.
{{gap}}'अने, एखादं खराब फडक टाक खाली. आज या भ्रमणसंगिनीची फार दिवसांनी सेवा करतो आहे.' सायकल बाहेर काढीत श्रीनाथने अनूला सांगितले. सायकल पुसुन त्याने सायकल स्टँडच्या दिशेने वळवली. नरहरीअण्णांनी दिलेले पत्र पांडबाला देऊन वहिनींना अण्णांची खुशाली सांगितली. पांडवाने ते पत्र मामीच्या...वैनींच्या हातात दिले. वैनीना वाचता कुठे येतेय. त्यांनी ते पत्र परत श्रीनाथच्या हातात दिले. पत्र पांडबाला लिहिलेले होते. शेवटच्या दोन ओळी वैनींसाठी होत्या. नरहरीअण्णांनी लिहिले होते, "पांडबा, तुज्या मामीला निगुतीने सांभाळ. तिला दमा आहे. आद्रक घातलेला च्या तिला लगतो. लई भोळी आहे तुझी मामी. तिची काळजी घे. तिला रडू देऊ नको. सांभाळा.." हे ऐकतांना वैनी मुक्याने मान खाली घालून आसवं ढाळू लागल्या. श्रीनाथ मुकाट्याने घराबाहेर पडला. आणि सायकल अशक्याच्या घराकडे मारली. अशोकची उंचीपुरी, रूंद हाडाची आई खूप खंगली आहे. गळ्याची हाडं दिसायला लागली आहेत. श्रीनाथला पाहातच तिने त्याचा हात घट्ट धरून हंबर्डा फोडला.
{{gap}}'माझं लेकरू सोबत न आणताच कसा आला रे बाबा एकटा? कसा हाय माजा आशक्या? तुच्या मुळंच आडकलं रे माज लेकरू...' अशोकच्या आईला शांत करताना त्याच्या वडलांचा दम निघाल. अशोकचे पत्र त्याच्या आईला देऊन, त्याची खुशाली सांगून, श्रीनाथने साकयल अमनच्या घराच्या दिशेने पळवली.
{{gap}}अमनच्या अम्मींना खूप कमी दिसतं. गाजियाबादच्या रईसघरात वाढलेली पंधरासोळा वर्षाची मुलगी पन्नास वर्षापूर्वी मराठवाड्यातल्या आडवळणाच्या गावाला, निजाम स्टेट मध्ये रस्ते बांधण्याची गुत्तेदारी करणाऱ्या तरूणसोबत आली. अमनचे अब्बा दिल्लीचे. मामा सोबत ते गुत्तेदारी व्यवसायासाठी निजाम स्टेट मध्ये आले. मोमिनाबादला... अंबाजोगाईला बिऱ्हाड मांडले. अम्मीनी आब्यांचा संसार खूप कष्टाने, समाधानाने केला. अमन सगळ्यात धाकटा म्हणून लाडका.
{{gap}}'आओ, बेटा. आओ. पॅरोलपे आये हो? कितने दिनका पॅरोल मिला है?' श्रीनाथला आलिंगन देत आब्बांनी विचारले. पांढऱ्याशुभ्र दाढीला कुरवाळत आतल्या दिशेने आवाज देत सांगितले,
{{gap}}'अमनकी अम्मीजान, देखो बाहर कौन आया है. गाजियाबादी टेस्टकी बढिया<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९५ }}</noinclude> ojciqu9yqvexel7i8d9z5jy1ya8wjs4 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९६ 104 70919 155693 2022-08-13T04:54:21Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>चाय बनाओ. रेहाना को बुलावा भेजो.'
{{gap}}आब्बा, अम्मी, रेहानाआपा यांना अमनची खुशाली सांगितली. घट्टदुधाचा, विलायची घातलेला स्पेशल चहा घेऊन तो घरी परतल मोहितेकाका आणि मंडळी श्रीची जेवणासाठी वाटच पाहत होती. इरा आणि जनक श्रीनाथला क्षणभरही सोडायला तयार नव्हते. आणि भेटायला येणाऱ्यांची रीघ.
{{gap}}'माँ, बघ ना ग. लोक सारखे बाबाला भेटायला येताहेत. मला बाबाला खूप प्रश्न विचारायचेत. तुरुंग कसा असतो? तिथे जेवायला काय मिळतं? तुरुगांचं कुलूप खूप मोठं असतं का? नी माँ, बाबा थोडे गोरे झालेत. होना ग?' जनकची तक्रार. इरा बाबाला सोडायलाच तयार नव्हती. श्रीनाथला तंबाखूची तल्लफ आली. त्याने ईराला शबनम पिशवी आणायला पाठवले. त्यातले बिस्किटांचे पुडे सकाळीच जनक ईराला दिले होते. शबनमध्ये हात घालून त्याने तंबाखूची पुडी आणि चुन्याची चपटी डबी काढली. ते ईराने पाहिले नि ओरडली.
{{gap}}'बाबा काय घाण खातोस रे ! शेजारचे काका पण खातात. तर मी त्यांना माझी पपी घेऊ देत नाही. तुझ्याशी कट्टी करून टाकीन हं मी! फेक ते.' असे म्हणत श्रीनाथच्या हातातली पुडी ओढून घेऊन ती ईराने बाहेर फेकून दिली.
{{gap}}संध्याकाळ वाढत चालली होती. श्रीनाथच्या आवडीचं शेंगादाण्याचं कुट घालून केलेले हिरव्या मिरचीचं चटकदार पातळ पिठलं. कुकरमध्ये न लावता खरपुडी लागेल असा पितळेच्या पातेल्यात केलेला भात, शेंगदाण्याची चटणी, ज्वारीची भाकर, असा खास बेत अनुराधाने रांधला होता. दिवसभराच्या ट्रे सर्व्हिसने मनसोक्त आनंद दिला तरी अनूला थकवाही आला होता. इरा न जेवताच बाबाला लगटून पेंगू लागली होती. जेवतानाच जनकने जाहीर करून टाकले.
{{gap}}'माँ, आज झोपतांना बाबांशी खूप गप्पा मारणारेय मी. सांगून ठेवतो'
{{gap}}'येस बेटा. रात्रभर गप्पा मारू आपण. पोटभर जेवूया. मग गप्पाच गप्पा.' अनूकडे एक चोरटा कटाक्ष टाकित श्रीनाथ ओठातल्या ओठात हसला. नि जनकची समजूत घातली.
{{gap}}श्रीनाथ सोबत काय काय द्यायचे याचे चक्र अनूच्या मनात जेवतांना फिरत होते. परवा संध्याकाळी किंवा तेरवा निघावे लागणार. दर महिन्याला नाशकाला जाताना अनू, अशक्या, अमन, अण्ण्या यांना आवडणारे पदार्थ भरपूर प्रमाणात घेऊन जाई. श्रीला आवडणारे मेथीचे तीळ घालून केलेले धपाटे तर कधी पालकपुऱ्या. कधी<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९६ }}</noinclude> 3atk6ddrmwc1mfgljyufwbmxuiawvxt पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९७ 104 70920 155694 2022-08-13T04:58:16Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>गोडदशम्या. दिवाळीत अनूची आई आणि तिच्या मैत्रीणींनी दोन टोपल्या भरून अनारसे पाठवले होते. श्रीला अनारसे खूप आवडतात. विचार करता करता तिने किलोभर शेंगदाण्याची चटणी मिक्सर मधून काढली. शेवटचा हात फिरवतांना मिक्सरमध्ये थेंबभर तेल घातले. तसे केले की चटणी खलबत्त्यात कुठल्यासारखी गुळचिट् होते. स्वयंपाकघर आवरून ती मधल्या खोलीत आली. श्रीनाथने दोनही मुलांना गाद्या टाकून झोपवले होते. सायलीचा दाट गरजा स्टूलवर. हे काम नक्कीच सुधावहिनींचे. संध्याकाळ पासून गजरा वेणीत माळ म्हणून मागे लागल्या होत्या. पण येणाऱ्या जाणाऱ्यांच्या गर्दीत हे कुठले जमायला? ती जवळ आली आणि श्रीनाथने दिवा मालवून टाकला. अनूचा हात आणि शेपटा ओढून तिला जवळ ओढले....
{{gap}}.... अनू दरवाजा उघडून पलिकडच्या व्हरांड्यात आली. घराशेजारच्या पारिजातकाखाली शुभ्र केशरी फुलांचा सडा सांडलाय. उजवीकडच्या अरूंद गॅलरीत ती उभी राहिली. आजची पहाट खूप सुंदर आहे. अंधार मावळायचाय.... कितीतरी दिवसानंतरही काल रात्रीची निवांत भेट शब्द संपलेले होते. मराठी शिकवणारे फाटकसर भाषाशास्त्र शिकवितांना सांगत की शरीराचीही एक समृध्द भाषा आहे. मानवी मनातील भावानांचे गडद... फिके रंग समोरच्या व्यक्तीच्या मनापर्यंत पोचविण्याची ताकद त्या बॉडी लँग्वेजमध्ये असते. स्वरयुक्त भाषेच्या विकासासोबत ती, शरीरभाषा माणूस विसरत गेला... काल रात्रभर त्या विसरलेल्या भाषेचा साक्षात प्रत्यय. संताप, दुःख, विरह, आत्मीयता, उदासी, उद्विानता... अनेक भावना स्पर्शातून, हालचालीतून व्यक्त होणाऱ्या... पंधरा वर्षांपूर्वी ऐकलेल्या, शिकलेल्या शब्दांना अचानक फुटलेली कोवळी पालवी अनुभवून अनू तृप्त आणि अस्वस्थ झाली. खुदकन हसूही आले आणि ती घरात शिरली.
{{gap}}'अनू, बप्पा देशमुख नऊला जीप पाठवताहेत. मुलांना शाळेत पाठवू नकोस. गावातल्या वकीलभाऊंना भेटून धानोऱ्याला जाऊ. सायंकाळी आंब्याला परतू. मला थोडे पैसे दे. श्रीदादांच्या मुलासाठी सेप घेऊन येतो.' अनूने दिलेले पैसे घेऊन श्रीनाथ त्याला आवडणान्या कांदेपोह्याचा नाश्ता घेऊन घराबाहेर पडला. अनू गावाकडे जायच्या तयारीला लागली. गेल्या चार महिन्यात तिचीही गावाकडे फेरी झाली नाही. श्रीच्या आईला... बाईला अशात खूपच कमी दिसतं. अनू या घरात आल्यापासून बाईंना वाकलेल्या पाठीचेच पाहिले आहे. खूप उंच असाव्यात त्या. श्री आणि दादा त्यांची उंची घेऊन आले आहेत. आणि जनकही. बाईंना पाठीचा विकार होता.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९७ }}</noinclude> 88qexgrc4gbz2gms861ufebia92646q पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९८ 104 70921 155695 2022-08-13T05:04:05Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>श्रीनाथचीही पाठ गेल्या तीनचार वर्षापासून खूप दुखते. बाईंची तेरा बाळंतपण झाली. त्यातली वानीकिनीची दोन जगली. श्रीनाथचे काकाजी आणि त्यांचे धाकटे भाऊ छोटा काकाजी पूर्वी एकत्रच राहत. त्यांना लग्नांनतर चौदा वर्षे मूलबाळ झाले नाही. त्यांचा मोठा मुलगा बदरीनाथ आंब्याला वकील आहे. श्रीनाथच्या बाईची पहिली आठही मुलं मातीत लोटावी लागली. त्यांच्या आठवणींनी आजही बाई आसू गाळतात. नववे श्रीकांतदादा. तेरावा श्रीनाथ. दादा आणि श्रीमध्ये सहा वर्षांचे अंतर आहे. धाकटे छोटा काकाजी व काकी वकील भाऊंकडे आंब्याला राहतात. चुलतमालत असे कधीच जाणवत नाही. श्रीदादा दुकान, शेती सांभाळतात. पूर्वी बाईला... घरातल्या बाईला शेणसडा करावाच लागे मग ती गर्भारशी असो वा अंगावर दुधपित्या बाळाची आई असो. शुक्राची चांदणी उगवल्यावर जातं घरघरू लागे. मग शेतातल्या गड्यांचा व घरचा स्वैपाक, धुणं... भांडी... झाडझुड सारं काही बाईनेच करायचे. न कुरकुरता. न थकता. श्रीच्या बाईला नस-तपकीर ओढण्याची तल्लफ येते. त्यांचा मुड असला की त्यांनी केलेल्या कष्टाच्या, सोसल्या यातनांच्या, छोट्या घटनांतून मिळणाऱ्या आनंदाच्या कहाण्या उत्साहाने सांगत. ऐकतांना मन विस्फारून जाई. वाटे, यांच्या जगण्यातलं संचित कोणतं?
{{gap}}'अगं, शिऱ्याच्या बापानं कंदी बाजार केला न्हाई. बसल्याजागी हिसेब ठेवणं, वह्या लिवणं त्याच काम. बाजारहाट लालजी... धाकटे काकाजी करीत. वरसातून दोन येळ लुगडी घेतली जात. नाट्या आनल्या की पयले माज्या समूर ठेवत. म्हणत, भाबी, उचला तुमच्या मनाची. पण म्या धाकलीला बलावून तिला पैला मान देई. मग उरलेलं मला. धाकली पण खुश असे. मला माहेरचं कुनी नवतं. पिलेगच्या बिमारीत आख्खं घर खर्चल. येक रंडकी भोजाई आन् मी. मी असेन पंधरासोळाची. पयला मुलगा तवा पोटात व्हता. तो मरून बी झाली तीन इसा वरसं. मोहरून हौस कोन पुरविणार? सासरी मी वडिल. पण धाकलीची हौस करण्याचीच मला हौस वाट.' असे म्हणत त्या खुशित निर्मळपणे हासत. तपकिरीची चिमुट नाकासमोर घेऊन हुंगत जमिनीला हात टेकून उठताना म्हणत, 'निभलं माय आमचं. तुमचं बी निभल. तुलसी माय हाय पाठीशी. हीच परमेसराजवळ इच्छा.' आणि तुलसीकडे पाहून हात जोडीत.
{{gap}}वीस एक वर्षापूर्वी धानोऱ्याच्या वाड्यात दरोडा पडला होता. त्यात बाईचे, धाकट्या काकीचे सगळे दागिने चोरीला गेले होते. पुसातला.. पौंषातला रविवार होता. डोक्यावरून न्हातांना भांगातलं बोर, सोन्याच्या पाती आणि काळ्या मण्यांचे<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९८ }}</noinclude> gqd7b7oeaoecr9koz4gjkp7wrguc1bq पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/९९ 104 70922 155696 2022-08-13T05:08:10Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>गंठन काढून ठेवले होते. धाकट्या काकींनी पूजापातीच्या वेळी बोर गंठन घातले. पण बाईनी स्वैपाकाच्या धांदलीत एका वाटीत काळी पोत गळ्यात ठेवली. तेवढीच जवळ राहिली. धाकटया काकींचे माहेर खाऊन पिऊन टंच. भाई पांच, दिवाळीच्या निमित्ताने भावांनी त्यांना पाटल्या, बांगड्या, आंगठ्या, कमेचा पट्टा सर्व दागिने घडवून दिले. श्रीनाथच्या बाईला माहेरच नव्हते. तिला कोण काही देणार? श्री तुरुंगात जाण्यापूर्वी चार दिवसांसाठी घरी राहिल्या. एरवी काकाजी, बाई आंब्याला आले की वकीलभाऊंच्या घरी रहात. अनूकडे आल्या असतांना तिचा हात हातात घेऊन बाईनी हलक्या आवाजात सांगितले होते,
{{gap}}"बिनणी, मला सोन्याचा पत्रा चढवलेले लाखेचे तीन मनी आणून देशील? दोनशे रूपये तरी लागतील ग. माय, तू पगारदार हाईस. लई दिसांपासून मनात हाय. पन सांगणार कुनाला? मी सालभरात धा-ईस करून फेडून टाकीन. निस्त्या काळ्यामन्यांनी गळा बुच्चा दिसतू ग. आन् हये शिऱ्याला सांगू नगस बर का!'
{{gap}}अनूला सासूबाईची ही साधीशी मागणी ऐकतांनाही कसेसे झाले होते. नंतर लागलेली आणीबाणी, दरमहा नाशिकला दोन लेकरांना घेऊन जाणं. या धांदलीतही दरमहा मिळणाऱ्या चारशेऐंशी रूपयातले पन्नास रूपये ती मागे टाकी. त्यातून तिने सोन्याचे चाळीस मणी, पंचवीस पाट्या, मधोमध लालखडा बसवलेली वाटी, असे ओवून सुरेखसे गंठन तयार करून घेतले होते. गंठनची डबी तिने पर्समध्ये नीट ठेवली. दशम्याधपाट्यांचा डबा बांधून घेतला. आणि ती श्री व जीपची वाट पाहू लागली. सुरवातीस बप्पा देशमुखांना अटक झाली होती. पण नंतर ते गळाले. पण पैसे जमवणे, अशोक, पक्या, अण्ण्या यांच्या घरी आर्थिक मदत करणे, ही कामे ते करीत. पाटोद्याच्या जगन मस्केच्या घरी दर महिन्याचा किराणा स्वतः पोचवत. बप्पा नासिकलाही दोनदा जाऊन आले होते. न सांगता जीप पाठवून देतो असा निरोप पाठवला होता त्यांनीच.
{{gap}}श्रीनाथची जीप धानोऱ्यात पोचताच आख्खे गांव भरारा वाड्यात जमा झाले. सगळे जुने मित्र, जुनी जाणती माणसे, बाईच्या मैत्रीणी सगळे येत जात होते. पण वरच्या आळीतला यादवकाकांचा गणू कुठं दिसेना. माळ्याच्या आळीतला शिवा, धाकट्या गढीतला बिभीषण... बरोबरचे अनेक मित्र दिसेनात... श्रीने सगळ्यांची आठवण काढली. गणू त्याचा जिगरी दोस्त. तो सहा महिन्यांपूर्वीच पुण्यात सहाव्या मजल्याला बाहेरून सिमेंटचा थर चढवतांना खाली पडून खर्चला होता. गावातले चार<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ९९ }}</noinclude> kveg2qhjjlp99s3k52vflbszql3qvwu पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०० 104 70923 155697 2022-08-13T05:12:24Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>दोन देशमुख, दोन तीन मारवाडी, तीन मेहमनी यलम, एखाद दुसरा ब्राम्हण अशी दहाबारा घरे सोडली तर सगळे शेतकरी दोनचार एकर वाले. त्यातही बहुतेकांची जमीन कोरडवाहू. बलुतेदारांकडचे काम कमी झालेले. गावातील बरीचशी तरूण मंडळी पुण्यामुंबईकडे भाकरीसाठी पांगली आहेत. मजलेगाव धरणाचा एक कालवा धानोरा, कुंबेफळ, सातेफळाकडून जाणार आहे असा लोकांत बोलवा आहे. समज आहे. त्या आशेवर काहीजण गावात थांबले आहेत. गावाची कळाच हरवली आहे भर श्रावणातही गाव उदास वाटतेय. श्रीनाथ गणूच्या वडलांना भेटायला गेला. त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी दोन एकर जमीन शेजारगावच्या पाटलाला विकली. उरलेल्या तीन एकरात घर कसे चालणार? हे सारे ऐकून श्रीनाथची अस्वस्थता अधिकच गहिरी झाली.
{{gap}}श्रीनाथ, अनू धानोऱ्याला पोचण्यापूर्वीच विमलाभाबींनी भावकीतल्या बाया, त्यांच्या मैत्रिणी यांना बोलावून तीळशेंगदणाच्या गोड तेलच्या करून ठेवल्या होत्या. श्रीदादांनी माळ्यावरून प्लास्टिकचा मोठा डबा काढून दिला होता. तेलच्या गार होण्याची वाट पहात दोघीतिघी थांबल्या होत्या. बाईच्या सांगण्यावरून जवसाची चटणी कुटून तयार होती. उन्हं उताराला लागली. बाई काकाजी, गावातील मंडळी... सगळ्यांचा निरोप घेऊन जडशीळ पावलांचे ओझे सावरीत श्रीनाथ आंब्याकडे निघाला. बाईच्या गळ्यातले सोन्याच्या मण्यात ओवलेले गंठन खूप चमचमत होते. त्यावर झळाळी होती बाईच्या तृप्त मनाची.
{{gap}}'घराचा जिना चढतानाच सुधा वहिनींनी स्वागत केले. या. बघा कोण पाहूणे आलेत ते!'
{{gap}}अनूची आई चहा पीत होती. आईला पाहून अनू चकित झाली. खुश झाली.
{{gap}}'जावई पॅरोलवर आलाय हे कसं कळलं ग तुला? तुला पाहून श्री खुश होईल. तो वाटेतच उतरलाय. बाबा नाही आले?' आईला अनूने विचारले, 'आधी चहा पी' असे म्हणत सुधाताईंनी अनू समोर चहाचा कप धरला. जळगावच्या सुनिल दिघेला श्रीनाथच्या दुसऱ्या दिवशी पॅरोल मिळाला. त्याने सांगितल्यामुळे आई सकाळच्या गाडीने अंबाजोगाईला निघाल्या. बाबांना मात्र वेळ नव्हता. श्रीनाथने बप्पांची गाडी त्यांच्या घरी सोडली. चहा घेऊन बप्पांच्या मोटार सायकल वरून तो चनईला निघाला. भीमा पांचाळच्या लेकरांना भेटायला. चनईच्या शेवरे मामांकडे चौकशी केली. एवढ्यात दोन पोरं प्लास्टिकच्या बॅगचा फुगा फुगवून, त्याला दोरी बांधून तो फुगा<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०० }}</noinclude> e73k9p99l7obs0jergbczeywk8erzrm पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०१ 104 70924 155698 2022-08-13T05:17:50Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>उंच उडवीत पळत होती. त्यातल्या एकाला बोलावून शेवरेमामांनी बुधाजी पांचाळाला बोलावून घेतले. भीमाप्पाचा थोरला दहावी नापास होऊन एका गॅरेजमध्ये काम करीत होता. तो आंब्याहून रात्रीच येतो. चंद्रभागा हुशार आहे. सातवीत शिकतेय. बुधाजीच्या घरी जाऊन श्रीनाथने लेकरांसाठी शंभर रूपये दिले. चंद्रभागाला पुढच्या साली आंब्याला आठवीत घाला असे बजावून लेकरांचे फोटो घेऊन तो आंब्याकडं निघाला. आईने ही मंडळी येण्यापूर्वीच श्रीनाथला आवडणारी खास मारवाडी 'घोटेडी खिचडी' केली होती. घी, दही, पापड, आचार... लोणचे हे खिचडीचे चार यारही हजर होते.
{{gap}}रात्री देवठाण, दगडवाडीचे दहाबारा लोक आले. त्यात शिवादादा, अंकुश, आंजा, शेवंता मावशी, खरातकाका, राणू आणी ही मंडळी होती.
{{gap}}'श्रीभैय्या, लई खराब झालात.' श्रीनाथला कडकडून भेटतांना अंकुशा म्हणाला, 'श्रीभैय्या तुम्ही आमच्यासाठी मोर्चे काढलेत, सरकारशी भांडण घेतलेत आमच्यासाठी. आणि शिक्षा मात्र तुम्ही भोगता आहात.' गोविंददादा, खरात यांनी खंत व्यक्त केली
{{gap}}'आंजे, दादांच्या पाया पड. दादा, आंजी चांगलीच मुंबईकरीण झालीय. नाशकाला मिसावाल्यांसाठी पुस्तके गोळा करून पाठवणाऱ्यांत तीपण होती. दर शनिवारी गोरेगावला जाते. लोकाधार संस्थेत काम करते. यंदा बारावीला पास झाली. पण मला मात्र मुंबईत करमत नाय. डोळ्यासमोर सारखं गावाकडचं शेत दिसतं. काकानी, येऊन जा... येऊन जा असा लईच नाद घेतला व्हता. आंजाही चार वर्षात इकडे आली नव्हती. म्हणून काल हितं आलो. आन् तुम्ही आल्याचं कळलं.' अंकुशला किती बोलू नी किती नाही असे झाले होते.
{{gap}}रात्रीचे अकरा वाजायला आले तरी घरातली गर्दी कमी होत नव्हती.
{{gap}}दरवाजा बंद करण्यासाठी अनू गेली तर दारात, रोज खाली थांबणारे सीआयडीचे शिपाई भुरेवार भाऊ आणि साखरे काका उभे होते. 'श्रीभैय्या, आज वायरलेस आला व्हता. आमी कळवलंय तुमी हितंच आहात म्हणून. आमी खालीच बसतो. पाणी प्यायचं झालं तरी वैनीचं दार ठोठावायला लागतं. तुमी वैनीची काळजी करू नका. आमी माणसंच हाऊत. पण पोटाला भाकर देणारी चाकरी, करायलाच हवी. येतो आमी!' ते दोघे जिना उतरून गेले आणि अनूने दार लावून घेतले. {{Css image crop |Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf |Page = 101 |bSize = 393 |cWidth = 41 |cHeight = 20 |oTop = 519 |oLeft = 302 |Location = right |Description = }}<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०१ }}</noinclude> rdl07ps9vji4oatfwg0msippxoao2v3 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०२ 104 70925 155699 2022-08-13T05:23:05Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{x-larger|'''९.'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}शहाण्णव तास.. पुरे चार दिवस मोकळ्या हवेत भरभरून घेतलेला श्वास उरात साठवून, श्रीनाथने पुन्हा एकदा नासिकच्या मध्यवर्ती कारागृहातच्या दगडी भिंतीच्या आत प्रवेश केला. आतल्या गेटवरच्या हापपोलिस साहेबांनी त्याची तपासणी केली. चाकू, सुरे, पिस्तूल, .... असल्या खास वस्तू बाहेरच्या हवेतून आत घुसल्या तर? पॅरोलच्या कागदावर सही करतांना त्या हापपोलिसाच्या वरच्या साहेबालाही हसू आलं.
{{gap}}"वेलकम श्रीनाथ. तुमचा छोटा दोस्त अमनचा, पॅरोलही मंजूर झालाय. हा पिवळा डगलेवाला रामसिंह जन्मठेपवाला कैदी. थेट बिहार-नेपाळच्या बॉर्डरवरचा. शस्त्रास्त्रांची ने आण करण्यात मशहूर. दोन खून याच्या नावावर जमा, तुम्ही ज्याचं नाव हाप पोलिस ठेवलंय तो तुमची झडती घेतोय, शस्त्र बाहेरून आणली नाहीत ना हे पाहण्यासाठी! तेही पोलिस खात्याचा सहाय्यक म्हणून...!" गेटवरचे अधिकारी मांजरमकरांनी आपलं मन मोकळ केलं. त्यांना निवृत्त वहायला अवघे आठ महिने उरले आहेत. गप्पा मारणे, गेल्या तीस वर्षातल्या अनुभवांची सरबत्ती नव्याने आलेल्या, लेखक... प्राध्यापक ... वकील..अशा मिसा कैद्यांवर फवारणे, ही त्यांना मिळालेली सुवर्ण संधी. ती ते पुरेपूर घेतात.
{{gap}}'दादा, तुम्ही झक्कास पैकी पुस्तक लिहा, तुमच्या या स्पेशल अनुभवांवर...' असे म्हणून त्यांना थोपवत श्रीनाथ त्याच्या बरॅककडे जाण्यासाठी वळला.
{{gap}}अमन, नरहरी अण्णा, अशोक, प्रविण, बन्सीधर... सगळेच त्याची वाट पाहात होते. जादुगाराच्या पोतडीसारख्या एका सुरेख शबनममधून त्याने सगळ्यांच्या घरून आणलेली पत्रं, पुस्तकं ज्याच्या त्याच्या स्वाधीन केली. देशपांडे काकूनी सरांसाठी मेतकूट आणि पूडचटणी दिली होती. मेतकूट म्हणजे श्रीनाथचा 'वीकपॉईंट'.
{{gap}}"सर, आणण्याची 'आणणावळ' मिळाली पाहिजे हं" असे बाजावत त्याच्यासाठी आणलेल्या वस्तू त्यांना दिल्या. आंघोळीला जातांना अमनच्या कानात हळूच सांगितले<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०२ }}</noinclude> inn2ta7zze1vnvt5kildkowqq0sth7d पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०३ 104 70926 155700 2022-08-13T05:28:32Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}"लेका, तुझ्या वैनीनी खमंग तेलच्या दिल्यात. संध्याकाळचा भत्ता एकत्र बसून खाऊ. तू सांग सगळ्यांना"
{{gap}}पुन्हा एकदा 'तेच ते तेच ते' पाढा सुरु झाला. आंब्याहून येतांना त्याने देवीप्रसाद चटोपाध्यायांचा 'लोकायत' हा ग्रंथ आणला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याला तो हवा होता. अनूच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात तो नुकताच आणला होता. ग्रंथपाल प्रभाकर जोशी भेटायला आले तेव्हा येताना काही नवी, चांगली, दुर्मिळ पुस्तके घेऊन आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, बहिष्कृत भारत, शरद पाटलांचं 'दास शुद्रांची गुलामगिरी' ही हवी असलेली पुस्तके त्यात होती. एक नवं बेट हाती आलं होतं. श्रीनाथ खुश होता. राजबंदींना मिळणाऱ्या सवलती मिळाल्यापासून कॉट्स, स्वच्छ चादरी, तकिया.. उशा, टेबललँप, या सोयी मिळाल्या होत्याच. त्याचा पुरेपुर उपयोग श्रीनाथ घेत होता. अनेकजण रोज मिळणाऱ्या फलाहारावर... सफरचंद, केळी, चिकू, नाकिशची द्राक्षं याच्या स्वादामुळे, तसेच रोज मिळणाऱ्या पंचवीस ग्रॅम साजुकतुपावर खुश होते. श्रीनाथ रात्रंदिवस त्या भल्यामोठ्या तक्क्याला टेकून वाचण्यात गुंग होई. 'लोकायत' म्हणजे एक महासागरच, सर्व सामान्य माणसाच्या जगण्याच्या अनुभवातून एक जीवनरीती निर्माण झाली. या जीवनरीतीवर आधालेले अत्यंत प्राचीन असे तत्वज्ञान म्हणजे 'लोकायत'. 'लोकेषु आयतः' ते लोकायत या शब्दाची विलक्षण मोहिनी श्रीनाथच्या मनावर पडली होती. ग्रामीण परिसरातील मारवाडी... राजस्थानी कुटुंबांत वाढतांना समाजातील जातीयतेचे थैमान, त्याने अगदी आठवते तेव्हापासून अनुभवले होते. त्या छोटाशा गावात भटगल्ली, पाटील गल्ली, देशमुखांची गढी, माळवाडा अशा वस्त्यातून त्या त्या जातीचे लोक रहात. त्याच्या गावात चौथीपर्यंत शाळा होती. वर्गात सगळ्या जातीजमातीची मुले असत. पण बसतांना मात्र अगदी आपोआप त्यांच्यात एक न दिसणारी भिंत असे. पाटील देशमुखाच्या जवळ ब्राम्हणाची चार दोन पोरं बसत. नंतर मारवाडयाची. माळी, शिंपी, सोनार मुलांची एक रांग, मग लोहार, सुतार, मुसलमानाची मुलं. गावकुसाबाहेर रहाणाऱ्यांच्या मुलांची रांग वेगळी असे. चार दोन मुली असत. त्या मास्तरांच्या खुर्ची शेजारी बसत. नाना माळी, लखू यादव, शिवा पन्हाळे श्रीनाथचे खास दोस्त. तो कधी त्यांच्या शेजारी जाऊन बसला तर घरी लगेच बाईला कळत असे. भवतालच्या भावकीच्या घरातील शिवनारायण, भगवानदास ही मुलं घरी कळ लावून जात.
{{gap}}"माळ्या मराठ्या का छोरां साथं क्यूं खेलं रे?....अपणा अपणा जात का छोरां साथं खेलणो... बिरामणाका छोरां साथं खेलनो...!!" हे ऐकत तो दहावर्षांचा झाला.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०३ }}</noinclude> 6w65tp8w3ds7my1uztgu9mj73w7i5qz पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०४ 104 70927 155701 2022-08-13T05:32:29Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>पाचवीला अंबाजोगाईच्या योगेश्वरी शाळेत आल्यापासून मात्र त्याच्या मित्रांचा परिघ खूप... खूप रूंदावला. वर्गातील मुलींची संख्याही वाढली. गावचे मित्रही तिथे आले. वसतीगृहात सर्व जातीजमातीची मुले एकत्र राहत. पण जेवणासाठी मात्र नंदूलाल शर्माच्या 'समाधान' मध्ये ब्राम्हण मारवाडी मुलं जात. तर डोंगऱ्यांच्या खानावळीत देशमुख, मराठा, वंजारी, सोनार, सुतार आदि बहुजन समाजातील मुलांचा भरणा असे. एक एक वर्ग श्री पुढे जात होता. पण अगदी लहानपणापासून मनात साचलेला जातीजमातीच्या प्रश्नांचा गुंता मात्र सुटत नव्हता. सुट्टीला गावाकडे आल्यावर घरात आल्या आल्या नानी ओरडून सांगे.
{{gap}}"झुमके, देवळीतलं गोमुतर शिऱ्याच्या अंगावर शिंपड, आणि मगच रसोईपर्यंत घे त्याला!"
{{gap}}आठवीत गेल्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवरचा धडा त्याच्या वाचण्यात आला. आणि एक बारिकसा किरण अंधारात चमकावा तसे वाटले. आणि त्याच वर्षी बाबासाहेबांचे निधन झाले. शाळेला सुट्टी मिळाली म्हणून सगळी मुले नाचत घरी गेली. श्रीनाथ मात्र खूप अस्वस्थ होता. त्याने तो धडा तीनतीनदा वाचून काढला. बुध्दी, शहाणपण, हुशारी हे गुण जातीनुसार मिळत नाहीत. ते निसर्गतः, जन्मतः असतात. संधी मिळाली की ते चहुअंगानी बहरतात. पण जातीच्या दडपणाखाली अनेकांना संधीच मिळत नाही. या जाती कोणी निर्माण केल्या? ...का निर्माण केल्या? की निर्माण झाल्या? या प्रश्नांची उत्तर मात्र कोणाला विचारायची? हे प्रश्न नेहमीच पडत.
{{gap}}तो नववीत गेला आणि आकाश मोकळं व्हायला लागलं. साधू, किंबहूने, एकनाथराव, ग.धो. देशपांडे, बेथुजी, बर्वे.... यांसारखे गुरुजी मराठी, इंग्रजी, इतिहास, शास्त्र हे विषय शिकवत. यातील बरेच गुरुजी निजामशाहीत रझाकारांविरूध्दच्या लढ्यात सामील झालेले होते. तुरुंगातले बंदिस्त जीवन, अज्ञातवास यांना झेललेले हे शिक्षक मुलांना जगाच्या उंबरठ्यावर नेऊन बसवीत. त्याच वर्षी गणेशलालजींनी राष्ट्रसेवादलाची सायंकाळची शाखा सुरु केली. डॉ.बापूराव पाटील वैद्यकिय व्यवसाय ठोकरून सेवादलाचे पूर्णवेळ सेवक म्हणून मराठवाड्याच्या पाचही जिल्ह्यात फिरत. त्यांचा मुक्काम वसतीगृहात असे. त्यांनी डॉ.बाबासाहेबांच्या 'ॲनिहिलेशन ऑफकास्ट' या ग्रंथाचा सारांश त्यांच्या ओघवत्या, जोशिल्या भाषेत नववी दहावीच्या मुलांसमोर मांडला होता. आणि श्रीनाथच्या विचारांना, आचारांना एक वेगळी आणि नवी दिशा मिळाली होती. यावेळी येतांना 'लोकायत' बरोबरच डॉ. राम मनोहर लोहियांची ग्रंथ<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०४ }}</noinclude> af1u7le1d49qu6qotavdxziodedt59n पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०५ 104 70928 155702 2022-08-13T05:40:40Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>संपदा त्याने आणली होती. ग.धो. गुरुजींच्या तोंडून त्याने अनेकदा ऐकले होते की डॉ. राम मनोहर लोहियांचे विचार महात्मा गाधींच्या विचारांच्या पुढचे, त्याच दिशेने पडलेले क्रांतीकारी पाऊल आहे. लोहियांनी लिहिलेले निबंध वाचतांना त्या शब्दांचा नेमका अर्थ, क्षणोक्षणी जाणवत होता. पॅरोलवरून आल्यावर त्याचं बोलणं खूप कमी झालं होतं. सतत दोन तकिये घेऊन, अर्धवट पहुडल्या अवस्थेत तो तासंतास वाचत राही. टिपणवहीं सतत जवळ असेच. डॉ. लोहियांची काही वचने जणु त्याच्या मनात... नव्हे जगण्याच्या स्वप्नांत कोरली गेली.
{{gap}}त्या दिवशी संध्याकाळी बौध्दिकाच्या वर्गात त्याने डॉ. लोहियांच्या जाणीवेतील शिव, कृष्ण, राम आणि द्रोपदी यांच्या प्रतिमांचे श्रीनाथने नेमकेपण सांगितले...
{{gap}}O India, Mother, give us the mind of Shiva the heart of Krishna and work deed of Rama, create us with non-dimentional mind and an exuberant heart but a life of limits.
{{gap}}हे भारतमाते, आम्हा भारतीयांना या मर्यादित आयुष्यात कृतार्थ जीवन जगण्यासाठी शिवाचे सर्वसमावेशक उदार मन दे, श्रीकृष्णासारखे सतत सर्वांना समजून घेणारे 'देते' अंतःकरण दे आणि श्री रामचंद्रासारखे कृतीशील कर्तृत्व आणि विशाल हृदय दे.
{{gap}}त्याचे विवेचन संपले. दहा...वीस...पंचवीस क्षण नितांत शांत. आणि स्तब्ध. एक आगळीच निरामय शांती. दादाराव करमळकर... मिसा बंदीमधील सर्वात वृध्द स्वयंसेवक उठले आणि त्यांनी श्रीनाथला भरभरून मिठीत घेतले व म्हणाले...
{{gap}}'श्रीनाथ, राम मनोहर लोहियांविषयी आम्ही नेहमीच अत्यंत कुत्सितपणे बोलत आलो. पण त्यांच्या मनातील या प्रतिमा सर्वसामान्य हिंदूंच्या मनात पोचल्या पाहिजेत. त्यांचे भारतीय संस्कृतीमधील लेख मलाही वाचलेच पाहिजेत. वाः श्रीनाथः ! फार सुरेख विवेचन मांडलेस.'

{{gap}}... श्रीनाथने पत्राला सुरुवात केली.
{{gap}}"... अनू, या तुरुंगवासामुळे मी खूप खूप वाचू शकलो. लिहिण्यासाठी लागणारी प्रतिभा आजतरी माझ्याजवळ नाही. पण या नितांत वाचण्यातून ती माझ्याही मनात केव्हातरी प्रकट होईल अशी आशा मी जरूर करीन. सध्या मी डॉ.राम मनोहर लोहिया यांच्यात आकंठ बुडलोय. त्यांचे स्त्रियांबद्दलचे विचार, सप्तक्रांतीचे स्वप्न अक्षरशः भारावून टाकणारे ! तू आपल्या संसाराच्या भाकरीची जबाबदारी घेऊन मला आवडणाऱ्या कामासाठी मुक्त ठेवलंस. अनू, ग्रामीण भागातील स्त्रियांचे दुःख या<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०५ }}</noinclude> 1yrtxq1c55e2qnf7xfvagzt2936fs7r पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०६ 104 70929 155703 2022-08-13T05:44:54Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>डॉक्टरलाच कळले. स्त्रीवादी भूमिकेला उचलून धरताना शहरातील स्त्रीवादी कार्यकर्त्यांना ते ठामणे सांगत. स्त्रियांचे, सर्वसामान्य स्त्रियांचे, ज्या बहुतांशी ग्रामीण भागात राहातात वा झोपडपट्टीत राहतात, अशांचे प्रश्न प्यायलाही न मिळणाऱ्या पाण्याचे आहेत. उघड्यावर करावे लागणारे स्नान, शौच, वणवण फिरून शोधवे लागणारे सरपण आणि पाणी यांचे आहेत. इस्टेटीतील अधिकार, विवाह, यासारखे प्रश्न ऐरणीवरचे नाहीत.
{{gap}}अनू, ग्रामीण स्त्रियांचे प्रश्न तुझ्यासारख्या लेखणीची किमया बोटात असलेल्या उच्चशिक्षित शिक्षिकेने समजून घ्यायला हवेत. तू 'लोकायत' वाचले आहेस. देवीप्रसाद चटोपाध्यांच्या 'गौरी' चे नेमकेपण डॉक्टरांच्या पार्वती आणि द्रोपदीतून पहायला मिळते. तू त्यांची पुस्तके जरूर वाच. नव्हे वाचच!"
{{gap}}... हा हा.... म्हणता दिवस पुढे पळतील. मुलं मोठी होतील. तुलाही मग नवी दिशा शोधावीच लागणार. खरंय ना?
{{gap}}तुम्हा सर्वांना आठवण."
{{gap}}श्री ने पत्र पाकिटात घालुन बंद केलं. थोडी झोप काढून पत्र अमनजवळ नेऊन देऊ असा विचार करून तो उठला. झडझडून आळस देण्यासाठी हात वर करून जांभई दिली नि एक जीवघेणी कळ पाठीच्या मणक्यातून सळसळत थेट मानेपर्यंत पोचली. तो कॉटवर बसला नि दुसरी कळ परत सळसळत धावू लागली. लाटांवर लाटा आदळाव्यात, तशा या जीवघेण्या कळा. क्षणभर काय करावे समजेना. इतक्यात अशोक खोलीत आला. पिळवटलेला चेहरा, न सोसवणारी वेदना डोळ्यातून ओघळणारी. श्रीनाथचं हे वेगळं रूप पाहून अशोक घाबरला.
{{gap}}“भैय्या काय होतंय? काय दुखतंय? जरा आडवे व्हा. मी डॉक्टरांना कॉल द्यायला सांगतो. असे म्हणत अशोकने श्रीनाथला कॉटवर झोपवले आणि तो ऑफिसकडे पळाला. तेवढयात जातांना अमनलाही त्याने सांगितले.
{{gap}}दुसऱ्या दिवशी नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात श्रीनाथची तपासणी झाली होती. तेथील प्रमुख डॉक्टरानी मुंबईच्या दवाखान्यात नेण्याचे सुचवले आणि अवघ्या दोन दिवसात मुंबईच्या सेंट जॉर्ज रूग्णालयाच्या खास बंदिस्त वॉर्डात श्रीनाथ दाखल झाला.
{{gap}}या बंदिस्त रूग्णालय- वॉर्डात मिसा- राजबंद्यापेक्षा जास्त संख्येने वर्तमान पत्रातून ज्यांची नेहमी नावे झळकत, असे स्मगलर्स... खऱ्या अर्थाने मिसाकैदी - कॅफेपोसाचे कैदी होते. पुकुर साँखिया, युसूफ हैपतुल्ला, नरेंद्र सारंग इत्यादी.
{{gap}}त्यांचा थाट काही वेगळाच. आठही बोटातून झगमगणाऱ्या रत्नजडीत अंगठ्या, अत्तराचा घमघमाट, जमादारापासून ते अधिकाऱ्या पर्यंत सारे त्यांच्यापुढे लवलवून<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०६ }}</noinclude> figxo8lp0xggpotbl8bpdz8of96a079 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०७ 104 70930 155704 2022-08-13T05:51:45Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>झुकणारे. दिवसभर ही मंडळी पत्ते खेळण्यात, सिगारेटी फुकण्यात दंग असे. दुपारी त्यांच्यासाठी घरून डबा येई. डब्याचं झाकण उघडलं तरी मस्सालेदार घमघमाट मिसा राजबंद्यांच्या खोल्यांत जाऊन पोचे. या खास कैद्यांनी राजबंद्यांनीही त्या अन्नाची चव घ्यावी म्हणून आग्रह केला. परंतु तो आग्रह सर्वानीच टाळला. राघव पै सोडले तर बाकीचे चौघेही शाकाहारी होते. ते खास कारण पुढे करणे सोयीचे झाले. हळू हळू श्रीनाथच्या आणि इतरांच्याही त्यांच्याशी गप्पा झडू लागल्या. पुकूर साँखिया जेमतेम पन्नाशीचा असेल. भरपूर वाचन. उत्तम इंग्रजी. त्याचे शिक्षण 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स' या जगन्मान्य शिक्षणसंस्थेतून झाले होते. नरेंद्र सारंग जेमतेम सातवी शिकलेला असेल. पण त्याच्या वागण्यातली, इंग्रजी बोलण्यातील इंग्रजी ऐट थक्क करणरी होती. या स्पेशल कॅफेपोसा कैद्यांसाठी सकाळी सहा वाजताच इंग्रजी, मराठी, हिंदी, गुजराथी दैनिके, साप्ताहिके, पाक्षीके, मासिके येत. संध्याकाळी सायं दैनिकांचा रतिब असे. व्हरांड्यात खुर्च्या टाकून दारू पीत पेपर वाचत बसण्याचा राजेशाही शौक या मंडळींना होता. व्हरांड्याला लगटून उभ्या आडव्या गजांची भक्कम जाळी होती ही बात वेगळी ! पण त्यातून सूर्य किरणे, चंद्रप्रकाश आरामात आत येई. तितक्याच सहजतेने कधी कधी कुजबूज ऐकू येई. 'काल रात्री दीड ते पहाटे पाच पर्यंत सारंग बाहेर होता'. आणि महिन्यातून दोन चारदा हे सारे सहाजण फेरफटका मारून येत. अर्थात पुरावा काय? मग गुपचूप... चुपचुप!!
{{gap}}दर रविवारी सायंकाळी व्हरांड्यात चौपाटी मांडली जाई. स्पेशल भेळ, पाणीपुरी, रगडा पॅटिस, तऱ्हेतऱ्हेची आईस्क्रीम आणि स्पेशल फालूदा कुल्फी. या चौपाटीत मात्र मिसावाल्यांनी आग्रहाने पाचही राजबंद्यांना सामिल करून घेतले होते.
{{gap}}श्रीनाथला स्पाँडीलायटिसचा त्रास सुरु झाला होता. पाठीच्या पाचव्या आणि सहाव्या मणक्यातले अंतर वाढले होते. शिवाय डाव्या पायाला सायटिक पेन... जीवघेणी कळ सुरु झाली की वेदना सहन करणे अवघड जाई. दोन तकिये उशाला घेऊन दिवस रात्रभर पुस्तके चावून चावून खाण्याचे हे परिणाम होते. पण त्या पुस्तकांनी दिलेल्या प्रचंड माहितीच्या साठ्यापुढे हा शारीरिक त्रास सहन होई. ट्रॅक्शन, फिजिओथेरेपी सुरु होतेच.
{{gap}}मुंबईतल्या सेंटजॉर्ज मध्ये आल्यापासून अनेक मित्रांच्या, नातलगांच्या भेटी होऊ लागल्या. अनूचे आजोळ मुंबईचे. मामा, मावशी, आत्या असे अनेकजण मुंबईकर होते. दिवाळीच्या सुट्या सुरु होताच जनक, इराला घेवून अनू गोरेगावाला आली. ती पोचण्याआधी तिची आईही माहेरी आली होती. इथल्या भेटी खूप निवांतपणे होत. बाबाला खूपवेळ भेटायला मिळते म्हणून जनक, ईरा खुश होते.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०७ }}</noinclude> s38jinwxv5qfjccx02o9axvs7fq726t पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०८ 104 70931 155705 2022-08-13T05:56:38Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}श्रीनाथची खास दोस्त सीमा साने मुंबईच्या बँक ऑफ इंडियात होती. रोज सकाळी ४/५ जणांसाठी पोहे, उपीट, साबुदाण्याची खिचडी असा खास नाष्ता ती आणत असे. दुपारी, संध्याकाळी कोणी ना कोणी भेटायला येत येतांना नवनवी पुस्तके आणीत. महिना झटपट निघून गेला. पाठीचे दुखणे थोडे कमी झाले. गळ्याला सतत कॉलर लावल्याने स्पाँडीलायटिसचा त्रास थोडा कमी वाटत होता. एक दिवस रात्री दोन मिसा बंदी अचानकपणे त्यांच्यात आले.
{{gap}}लोणावळ्याच्या योगा सेंटरचे प्रमुख वरद स्वामीच्या आश्रमात मायकेल डिसूझा, स्वामी आनंदन् या नावाने संन्यासी म्हणून राही. ध्यान, योगा यांच्या बरोबर आसपासच्या परिसरात, विशेष करून पुणे, हडपसर, खडकी येथे तो योगा क्लासेस घेण्यासाठी जाई. एक दिवस अचानक पोलिसांची धाड आश्रमावर पडली. मायकेलला तर उचललेच. परंतु वरद स्वामींची रवानगी येरोड्याला झाली. तेथील डॉक्टरांच्या कृपेने दोन दिवसात त्यांची रवानगी सेंट जॉर्जच्या खास वॉर्डात झाली. वरद स्वामी केवळ योगाचार्यच नव्हते तर त्यांचा भारतीय इतिहास, तत्वज्ञान यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या मते भारतीय संस्कृती आणि इतिहास यांची नेमकी जाण डॉ.राम मनोहर लोहियांना जेवढी होती तेवढी कोणाही भारतीय इतिहास वा तत्वज्ञानाच्या अभ्यासकाला नाही. डॉक्टरसाहेबांचा प्रत्यक्ष सहवास वरदस्वामींना लाभला होता. इतिहास या विषयाची उच्च पदवी दिल्ली विद्यापीठातून घेतल्यावर, त्यांनी दोन वर्ष डॉक्टरांचे सहाय्यक म्हणून काम केले होते. वरदस्वामीचे रेखाचित्रे रेखाटण्याचे कसब थक्क करणारे होते. त्यांचे मायकेलवरही नितांत प्रेम होते. जीवनाकडे पाहण्याची निरामय... निःस्पृह... निकोप दृष्टी मायकेलजवळ आहे. असे त्यांचे ठाम मत होते. घरात लेकरांची संख्या जास्त झाल्याने तीन नंबरच्या मायकेलला केरळातल्या ख्रिश्चन धर्माचे गुरु... पाद्री होण्याच्या शाळेत, त्याच्या वडीलांनी तो दहावर्षांचा असतांनाचा घातले होते. मायकेलने ख्रिस्ती तत्वज्ञानाचा अभ्यास मनःपूर्वक केला. एकीकडे त्याचे शालेय महाविद्यालयीन शिक्षणही सुरु होते. त्या काळात त्याने हिंदू षट्दर्शने, तीन अवैदिक दर्शने, कुराण, महाभारत, रामायण, चार्वाक, चाणक्य या सर्वांच्या जीवनविषयक तत्त्वज्ञानाची खोलवर शिरून भूमिका अभ्यासली. आणि घरी वडिलांना अत्यंत नम्र निग्रही शब्दात, ख्रिस्ती धर्मगुरु होण्याची दीक्षा घेण्यास संमती नसल्याचे कळविले. आणि एक दिवस मायकेल मुंबईत आला. रेल्वेस्टेशनवर हमाली करणारे हमाल, चतुर्थवर्गाचे कर्मचारी, मापाडीकामगार यांच्यात त्याची उठबस असे. त्यांच्यासोबत फुटपाथवर पेपर अंथरून मस्तपणे झोपही तो घेत असे. पहाता पहाता तो कामगारांचा<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०८ }}</noinclude> 33u4lra3qwmmbxx677zs61d1619irag पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०९ 104 70932 155706 2022-08-13T06:53:15Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>________________ नेता झाला. अमोघ वकृत्व. इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड भाषेवरचे प्रभुत्व. संस्कृतभाषेचे ज्ञान. यामुळे तो सत्ताधारी पक्षाच्या बड्या पुढाऱ्याचा पराभव करून लोकसभेतही पोचला. परंतु त्याने बिनइस्त्रीचे स्वतः धुतलेले स्वच्छ कपडे... पायजामा आणि नेहरूशर्ट..., एका खोलीचे घर, कार्यकर्त्यासोबत मिसळ नाहीतर वडापावाची न्याहारी यात फरक पडलेला नव्हता. मायकेल आणि वरदस्वामीची मैत्री लोहियाप्रेमातूनच जमलेली. आणीबाणीचा पुकारा हाताच मायकेल संन्याशाच्या वेशात थेट लोणावळ्याला पोचला. वषर्भर निर्वेधपणे त्याने पिंपरी, पुणे, हडपसर येथे जाणे, तेथून निरोप देणे घेणे महत्वाच्या निर्णयाबाबत विशिष्ट भाषेत संवाद करणे सुरू होते. परंतु एक दिवस गोंधळाचा आला. हडपसरहून दिल्लीला फोन लावला असता पलिकडून 'यस आनंदन्' म्हणण्याऐवजी चुकून 'मायकेल डियर' असे अनिता म्हणाली. अनिता त्याची बंगाली पत्नी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रशियनभाषा शिकवणारी अध्यापिका. एका शब्दाचा काडीचा आधार घेऊन पोलिसांनी मायकेलला शोधून काढले. अर्थातच त्याला आश्रय देणाऱ्या वरदस्वामींची रवानगी मिसा राजबंदी म्हणून येरवडा जेलमध्ये केली गेली. वरदस्वामींविषयी आदर आणि आस्था असल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना हार्ट पेशंट म्हणून सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये ठेवण्यास सांगितले. सेंट जॉर्जच्या बंदीस्त वॉर्डात वरदस्वामी दाखल झाल्यावर अवघ्या दोन दिवसात त्यांची आणि श्रीनाथची छान दोस्ती जमली. मायकेल डिसूझा विषयी ऐकले खूप होते. पण आता तर त्याला पाहिले... भेटले नाही तरी तो खूप जवळचा वाटू लागला. वरदस्वामी बसल्या बसल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया व मायकेल यांची वेगवेगळ्या भावमुद्रा रेखाटणारी, रेखाचित्रे सहजपणे काढीत. त्यांच्या मनाची एकाग्रता, त्यांची खोलवर जाऊन वेध...छेद घेणारी नजर, हे पाहणे हा एक चिरंतन अनुभवच, तो घेणे हा सुंदर योगायोग आहे असे, श्रीनाथला मनोमन वाटे.
{{gap}}वरदस्वामीनी पाँडीलायटिसची तीव्रता कमी करणारी काही योगासने त्याला शिकवली होती. स्वामीजींच्या सहवासात एक महिना कसा नि कुठे गेला कळले नाही. आणि एक दिवस परत नाशिक जेलमध्ये पाठविण्याचा खलिता मुंबईत आला. आणि श्रीनाथ नाशिकच्या मध्यवर्ती दगडीतुरुंगात दाखल झाला.
{{gap}}मुंबईत न जाणवलेली थंडी नाशिकामध्ये शिरताच जाणवू लागली. स्टेशनवर उतरतांना श्रीनाथला पुकुर सांखियाचे शब्द आठवले, 'भैय्या, आपके साथ बहुतही अच्छे तरीकेसे दिन कटे. याद रखना... भैय्या हम भी इन्सान है. और आनेवाली छब्बिस जनवरीके पहले आप आपने घर... अपने गाव चोक्कस पहुंच जायेंग. माताजीकी 'रॉ'<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०९ }}</noinclude> liye5r285ybesk0gu3h9vez8sy7q0as 155707 155706 2022-08-13T06:53:39Z अश्विनीलेले 3813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>नेता झाला. अमोघ वकृत्व. इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड भाषेवरचे प्रभुत्व. संस्कृतभाषेचे ज्ञान. यामुळे तो सत्ताधारी पक्षाच्या बड्या पुढाऱ्याचा पराभव करून लोकसभेतही पोचला. परंतु त्याने बिनइस्त्रीचे स्वतः धुतलेले स्वच्छ कपडे... पायजामा आणि नेहरूशर्ट..., एका खोलीचे घर, कार्यकर्त्यासोबत मिसळ नाहीतर वडापावाची न्याहारी यात फरक पडलेला नव्हता. मायकेल आणि वरदस्वामीची मैत्री लोहियाप्रेमातूनच जमलेली. आणीबाणीचा पुकारा हाताच मायकेल संन्याशाच्या वेशात थेट लोणावळ्याला पोचला. वषर्भर निर्वेधपणे त्याने पिंपरी, पुणे, हडपसर येथे जाणे, तेथून निरोप देणे घेणे महत्वाच्या निर्णयाबाबत विशिष्ट भाषेत संवाद करणे सुरू होते. परंतु एक दिवस गोंधळाचा आला. हडपसरहून दिल्लीला फोन लावला असता पलिकडून 'यस आनंदन्' म्हणण्याऐवजी चुकून 'मायकेल डियर' असे अनिता म्हणाली. अनिता त्याची बंगाली पत्नी. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रशियनभाषा शिकवणारी अध्यापिका. एका शब्दाचा काडीचा आधार घेऊन पोलिसांनी मायकेलला शोधून काढले. अर्थातच त्याला आश्रय देणाऱ्या वरदस्वामींची रवानगी मिसा राजबंदी म्हणून येरवडा जेलमध्ये केली गेली. वरदस्वामींविषयी आदर आणि आस्था असल्यामुळे तेथील डॉक्टरांनी त्यांना हार्ट पेशंट म्हणून सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये ठेवण्यास सांगितले. सेंट जॉर्जच्या बंदीस्त वॉर्डात वरदस्वामी दाखल झाल्यावर अवघ्या दोन दिवसात त्यांची आणि श्रीनाथची छान दोस्ती जमली. मायकेल डिसूझा विषयी ऐकले खूप होते. पण आता तर त्याला पाहिले... भेटले नाही तरी तो खूप जवळचा वाटू लागला. वरदस्वामी बसल्या बसल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया व मायकेल यांची वेगवेगळ्या भावमुद्रा रेखाटणारी, रेखाचित्रे सहजपणे काढीत. त्यांच्या मनाची एकाग्रता, त्यांची खोलवर जाऊन वेध...छेद घेणारी नजर, हे पाहणे हा एक चिरंतन अनुभवच, तो घेणे हा सुंदर योगायोग आहे असे, श्रीनाथला मनोमन वाटे.
{{gap}}वरदस्वामीनी पाँडीलायटिसची तीव्रता कमी करणारी काही योगासने त्याला शिकवली होती. स्वामीजींच्या सहवासात एक महिना कसा नि कुठे गेला कळले नाही. आणि एक दिवस परत नाशिक जेलमध्ये पाठविण्याचा खलिता मुंबईत आला. आणि श्रीनाथ नाशिकच्या मध्यवर्ती दगडीतुरुंगात दाखल झाला.
{{gap}}मुंबईत न जाणवलेली थंडी नाशिकामध्ये शिरताच जाणवू लागली. स्टेशनवर उतरतांना श्रीनाथला पुकुर सांखियाचे शब्द आठवले, 'भैय्या, आपके साथ बहुतही अच्छे तरीकेसे दिन कटे. याद रखना... भैय्या हम भी इन्सान है. और आनेवाली छब्बिस जनवरीके पहले आप आपने घर... अपने गाव चोक्कस पहुंच जायेंग. माताजीकी 'रॉ'<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १०९ }}</noinclude> bolaw1ylbi5ptnqxnwfsof6fgs8t416 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११० 104 70933 155708 2022-08-13T06:57:51Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>संघटनासे भी हमारा नेटवर्क जादा सेन्सेटिव, करक्ट और लॉयल है।'
{{gap}}नोव्हेंबर संपत आला होता. २६ जानेवारी म्हणजे किती दिवस? ...? असा हिशेब श्रीनाथचे मन नकळत मांडू लागले होते.

{{gap}}सेंट जॉर्जेस पासून व्हिक्टोरिया टर्मिनस- व्ही.टी. जेमतेम दहा मिनिटांच्या अंतरावर असेल. परंतु राजकीय कैद्याची पाठवणी पोलिस व्हॅन मधूनच होणार. दक्षिण, उत्तर, पूर्व.... भारताच्या तीनही दिशांनी पश्चिमेच्या अरबी समुद्रावर दिमाखात उभ्या असलेल्या भारताच्या प्रवेशद्वाराकडे धावणाऱ्या - गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने सुसाटणाऱ्या आगिनगाड्या व्ही.टी च्या भव्य, टर्मिनसवर येतात. लाखो माणसांना त्यांच्या फाटक्या तुटक्या गठुड्यात बांधलेल्या झगमगित स्वप्नांसकट घेऊन येतात.
{{gap}}त्या लखलखित दगडी भव्य परिसरात उतरतांना श्रीनाथने घड्याळात पाहिले रात्रीचा दीड वाजला होता. इलाहाबाद एक्सप्रेस दोन वाजता सुटणार होती. दहाही फलाटदादा माणसांच्या गर्दीने गजबजून गेले होते. श्रीनाथच्या दिमतीला साध्या वेशातले दोन हवालदार, एक पिस्तुलधारी पी.एस.आय. होता. गाडी फुफाटत आत आणि उभी राहिली. इतक्यात पुष्पा, सीमा, गजाभाऊ घाईघाईने त्याच्याजवळ आले. पुस्तके आणि खाऊने भरलेली एक शबनम श्रीजवळ दिली. तेवढ्यात राम सफरचंद आणि केळी घेऊन आला. पी.एस.आय. च्या नजरेतले प्रश्नचिन्ह पाहून गजाभाऊ नेहमीसारखे हो... हहो करून हसले आणि श्रीच्या पाठीवर हात ठेवित म्हणाले,
{{gap}}'साहेब आमचं गुप्तहेर खात तुमच्या 'रॉ' इतकं नसलं तरी बऱ्यापैकी चतुर आहे. आमच्या दोस्ताला सांभाळून न्या. आणि शिऱ्या, या आपल्या दोस्तांनाही कोल्हापुरी चिवडा आणि अनारशांची चव चाखव. आणि तोंडी लावणं म्हणून ची गव्हेराची क्रांतीगाथाही ऐकव.'
{{gap}}गाडी वेगाने पळत होती. डोळा कधी लागला ते श्रीनाथला कळलंच नाही. त्याला जाग आली तेव्हा गाडी घाटातून चालली होती. हिरव्याधुंद झाडांनी लपेटलेले डोंगर जागे होत होते. दवथेंबाचा झिरझिरित आरपार पडदा अंगभरून पांघरला होता. पूर्वेच्या कोवळ्या प्रकाश लाटांना भरती येऊ लागली नि तो अदृश्य झाला. कोवळ्या उन्हात हिरवे डोंगर पोपटपंखी झाले. प्रत्येक क्षणी नवे रूप घेणारा निसर्ग. ओंजळ भरभरून घेणार डोळे. श्रीनाथला अनूची आठवण झाली.
{{gap}}घाट पार झाला होता. उतारावर छोटे छोटे बांध... पौळ घालून जमिनीचे छोटे छोटे तुकडे मशागत केलेले दिसत होते. त्यात पाणी तुडुंब भरून ठेवलेलं होतं.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ११० }}</noinclude> bp3wfhryq03es1k4keu6do9df529qkl पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१११ 104 70934 155709 2022-08-13T07:02:50Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>बांधावर भाताच्या लावणीसाठी रोपांचे जुगडे तयार करून ठेवले होते. अधुनमधुन जुलैच्या भर पावसात लावलेली भाताची शेते आता सोनसळी होऊन झुलायला लागली आहेत. डिसेंबर अगदी अंगणात उभा आहे. ओचा पदर खच्चाटून खोचून आंबड्यात चवेणी अबोलीची फुले माळलेल्या शेतकरणी बांधाकडे लगालगा चाललेल्या होत्या.
{{gap}}... शेतकऱ्याचे जीवन किती कष्टाचे असते. एवढे कष्ट करून हाती काय येते. शेतमालाचा भाव ठरवणार दलाल आणि व्यापारी! या भागात पाणी तरी विपुल आहे. पण बीड जिल्हा?....एकूणच मराठवाडा? आमच्या नद्या कायमच तहानलेल्या. कोरड्या ठण्णं. त्याला नानीची आठवण झाली. नव्वदी ओलांडलेली नानी. तिचे आजोळ डोंगरातल्या साकुडाचे होते. लहानपणच्या आठवणी सांगतांना नानी रंगात यायची. अैंशी वर्षांपूर्वी ..."अरं म्हे घ्यावणी छोटी हाँ. थारा नानाजी का साथ म्हारा ब्याह हुयो, जरा म्हे सात आठ साल की ही..." नानीचं मराठवाडी मारवाडी ऐकायला खूप छान वाटायचं. त्यावेळी बुट्टेनाथाच्या डोंगरदरीत घनदाट झाडी होती. भर दिवसा जयवंती-वाणाच्या संगमावरून पल्याड जायचे म्हटले तर घाम फुटे जरा पाऊस बदबदून पडला की वाणा.... जयवंती भरभरून वेगाने वाहत. अल्याडली माणसं अल्याड नि पल्याडली माणसं पल्याड रहात. मात्र तासा दोन तासात पाणी वाहून जाई. पुन्हा वाळू खडकांचे राज्य. तिथे बिबटे राहत. हरणे बागडतांना दिसत. आज त्या डोंगरात तहानलेल्या वाळूच्या नद्या आणि बोडखे वैराण डोंगर उभे आहेत.
{{gap}}"चहा घ्या वकीलसाहेब. कुठे तंद्री लागली? लेकराबाळांची याद येत असेल नाही का?... संपतील हेही दिवस. श्रीनाथच्या हातात चहा देत पी.एस.आय. बोलले. चहा पितांनाही तेच विचार... एक दिवस पानात भात वरण नसेल तर उपास पडतो आम्हाला. पण पिकवणाऱ्याच्या लेकराबाळांना तरी पुरेसं अन्न, निवारा, शिक्षण, आरोग्य मिळत असेल? ...?"
{{gap}}इगतपुरी स्टेशन मागे पडले. श्रीनाथ फ्रेश होऊन... तोंड धुवून आला. अंगावर अनूने विणलेला लांब बाह्यांचा स्वेटर चढवला आणि नासिकची वाट पाहू लागला.
{{gap}}नासिक आता चांगलेच गारठले आहे. खरे तर नासिकहून गांवी परतण्यापूर्वी गंगेचे सुंदर घाट पहायचे आहेत. काळ्या रामाचे देऊळ, नारो शंकराची प्रचंड घंटा, दक्षिण गंगेचा शांत झुळझुळता प्रवाह, त्र्यंबकेश्वरचे पुरातन शिवमंदिर.... 'गर्जा जय जयकार क्रांतीचा' सारखे, तरूणांच्या अंगात उर्मी.... उर्जा फुलवणारे गीत लिहिणाऱ्या कवी कुसुमाग्रजांची भेट, या साऱ्यांना डोळेभरून पहायचे आहे. पण नासिकहून परतण्याची आहे का शक्यता?
{{gap}}श्रीनाथने मनातले विचार झटकून टाकले आणि तो अमनच्या बरॅकमध्ये<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / १११ }}</noinclude> pgrr4v8w628cwh0y5s6imikeq9d8ytl पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११२ 104 70935 155710 2022-08-13T07:07:44Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>शिरला. अमन ताजातवाना दिसत होता. अर्थात तो मरगळलेला दिसतो कधी? अमन आंब्याच्या समाजावादी गटातला सर्वात तरूण कार्यकर्ता. त्याच्या मनाचं अवकाश नेहमीच नवनव्या प्रश्नांनी, प्रतिक्रियांनी, कल्पनांनी झगमगलेलं असायचं. त्याचा प्रत्येक प्रश्न नवी दिशा शोधण्याचा ध्यास घेणारा असायचा. श्रीभैय्यांना पहाताच अमन उठला. भैय्याला शेजारी बसवीत म्हणाला.
{{gap}}"भैय्या, तुम्ही आला नसता तर मग मीच आलो असतो तिकडे....
{{gap}}भैय्या या बंद कारागृहाच्या दगडी भींतीतूनही आता वारे वाहू लागलेत. आहात कुठे तुम्ही? सुधिऱ्या पॅरोलवर चार दिवस जाऊन आला. त्यात दोन दिवस महाबळेश्वरला मधुचंद्रही साजरा करून आला. तो नंदा बरोबर लग्न करणार आहे, हे तर गावरगन्ना माहितच होतं. हा म्हणे सकाळी अंब्यात पोचला की दुपारी २ वाजता देवीमायच्या देवळात जाऊन लग्न लावल नि रात्रीच्या यष्टीने थेट पुणे नि महाबळेश्वर. आता त्याच्या पावलावर पाऊल टाकायला बन्सीधरही उतावळा झालाय. पण मध्ये धोंडा टाकलाय त्याचा खास दोस्तानीच!..." अमनची अपेक्षा होती श्रीभैय्या काही कॉमेंट... प्रतिक्रिया हाणतील. पण श्रीभैय्यांचं अमनच्या बोलण्याकडेही लक्ष नव्हतं. खिडकीतून बाहेर बघत कुठे तंद्री लागली होती कुणास ठाऊक. अमनने श्रीनाथला हलवून भानावर आणले.
{{gap}}"भैय्या कुठे गेलं मन? थेट आंब्याला की" {{center|<poem>मनऽऽ वढाय वढाय जसं पिकातलं ढोरऽऽ</poem>}} {{gap}}अमन गाऊ लागला. आणि श्रीनाथ वैतागला. पण स्वतःच्या वैतागाचाही राग आला. आणि अजीजीने अमनला म्हणाला, "अमन प्लीज गाऊ नकोस बाबा. दगडी भिंतीतून वारे वाहू लागलेत म्हणजे नेमकं काय? बाईच्या मनाचा दगड पिघळायला लागलाय का? बेट्या, त्या सुधिर बन्शाचं 'शाकुन्तल' मला नको सांगूस. तू नि अशक्या आजारी पडा नि सिव्हील हॉस्पीटलला एक फेरा मारून या बरं. म्हणजे खरी माहिती कळेल"
{{gap}}इथे आल्यापासून गेल्या चारपांच दिवसात त्याच्या लक्षात आलंय की या सतरा महिन्यांच्या बंदिवासाला प्रत्येकजण कंटाळलाय. गेल्या वर्षीच्या थंडीत अंगात रंग होती. बेडरवृत्ती होती. आणीबाणीला टक्कर देण्याची उर्जा होती. पण ह्या वर्षीची थंडी मात्र सहन करणे अवघड चाललेय. अशक्या सांगत होता की एक दिवस नरहरी अण्णा मध्यरात्रीच उठले. आणि तुरुगांच्या दरवाजापाशी जाउन उभे राहिले. त्यांना<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ११२ }}</noinclude> dlvk1ivcram4f1v8t5mu7ctcs6va3x6 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११३ 104 70936 155711 2022-08-13T07:11:26Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>स्वप्नं पडले होते की सर्वांची सुटका झालीय आणि तेच गाढ झोपेमुळे एकटेच तुरुंगात अडकले आहेत.
{{gap}}श्रीनाथच्या लक्षात आले की शर्मा नानाजींच्या चरख्याचा आवाज ऐकू येत नाही तसेच गीतेच्या श्लोकांचे हलक्या आवाजातले गुणगुणणे ऐकू येत नाही. गेल्या सहा सात महिन्यात शर्मा नानाजींच्या सहवासाची सवय झाली होती. १९४२ च्या चळवळीतले, १९३० सालच्या मिठाच्या सत्याग्रहातले अनुभव ऐकण्यात कारागृहातील तरूण मुले रंगून जात. त्यांच्याकडून महात्माजींच्या, विनोबाजींच्या सहवासातल्या आठवणी ऐकणे हा खास अनुभव असे. सांगता सांगता ते मध्येच थांबत. अमन बेटाला पाणी आणायला सांगत. आणि मग ऐकणाराला गुळाचा प्रसाद मिळे. त्यांना भेटायला त्यांची बहुरानी किंवा छुटकी बिटीया येऊन गेली की साखरेऐवजी चुरम्याच्या गुळ घालून केलेल्या लाडवांचा आणि खजुर बियांचा प्रसाद मिळे. अशा नानाजींची उणीव बरॅकमधील सर्वानाच भासत असे. शर्माजींना पाच दिवसा पूर्वीच सुटका झाली होती.
{{gap}}ठरल्यानुसार अशक्या, अमनचे पोट नि डोके दुखले. चांगला चार तासांचा मुक्काम जिल्हा रूग्णालयात ठोकून येतांना अनेक बातम्या, वर्तमानपत्रे, पुस्तके खाऊ घेऊन आले. तसे तर रूग्णालयात दहाबाराजण रोज जात. जो तो आपापल्या विचारांच्या दिशेने बातम्या गोळा करून येई. आज एक बातमी मात्र सर्वांनी सारखीच आणली होती. ती बातमी अनेकांना उल्हासीत करणारी होती तर अनेकांना अस्वस्थ करणारी. अमनच्या डोक्यात जुन्या आठवणींचे शोभादर्शक यंत्र वेगाने फिरू लागले. जयबाबूच्या सहवासातील ते दिवस.
{{gap}}१९७४ साली ६ मार्चला बिहारमधे जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली एक मोर्चा निघाला होता. त्यासाठी अमन आणि प्रकाश बिहारामध्ये गेले होते. जयप्रकाशजी त्यावेळी मुसहरी भागात लोकजागृतीच्या कामाची दिशा, कृतीकार्यक्रम यांवर विचार करण्यात गुंतले होते. मुख्यमंत्री गफूरच्या सत्तेखाली सामान्य माणूस दबला जात होता. सप्तस्वातंत्र्याचा ध्यास घेतलेले जयप्रकाशजी हाच एकमेव आशेचा दिवा होता. त्या अभूतपूर्व शिबीर व मोर्चात सामिल होऊन नवी उर्जा, नवे कार्यक्रम घेऊन अमन, प्रकाश परतले. अत्यंत लहरी, पात्र बदलून हजारो जीवने गिळणारी कासी नदी, अत्यंत सुपीक अशी बिहारची भूमि तिथल्या जमीनदारांच्या उद्दाम वृत्तीच्या सत्यकथा, तिथले अंतहीन...अपार दारिद्रय यांचे जवळून दर्शन झाले होते. परततांना ओरिसा पहायचे ऐनवेळी ठरले. तिथले दारिद्रय, आदिवासींची उपासमार, विलक्षण सुंदर हिरवाई, झाडांनी थबथबलेले डोंगर, उड्यामारणारे झरे, विस्तीर्ण समुद्र किनारा या<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ११३ }}</noinclude> gzgfztt13bt4hek7w3mo9zvbmuki70d पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११४ 104 70937 155712 2022-08-13T07:15:15Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>रंगीबेरंगी चित्रांत करूणाईची भीक मागणारे, खोल गेलेले चिमणे डोळे, गुरांची राखण करतांना त्यांच्या शेणातून धुवुन काढलेल्या साळी वाळवून, त्या कांडून त्याची पेज खाऊन घर जगवणाऱ्या आदीवासी बाया यांची चित्रे मात्र विसरता विसरत नव्हती. नासिकचा तिन्ही त्रिकाळाचा भत्ता खातांना अमन ती चित्रे आठवी आणि भत्त्याचा पहिल्या घास खाई. मगच तो खाणेबल होत असे.
{{gap}}...अमनच्या मनात जुन्या आठवणी अलिकडे ताज्या होत चालल्या होत्या. १९७४ च्या बिहार ओरिसा दौऱ्यानंतर ते १८ मार्चला ते अंब्यात पोचले आणि १९ मार्चच्या सकाळच्या बातम्यांत ठळक बातमी होती अठरा मार्चच्या तरूणांच्या मोर्चावर केलेल्या गोळीबाराची आणि त्यांत तेवीस तरूण विद्यार्थी हुतात्मा झाल्याची बातमी होती.
{{gap}}..... हे सारे आठवताच अमन मनोमनी खूप शरमिंदा झाला. आपल्या तेवीस तरूण बिहारी भावांनी सप्तस्वातंत्र्यासाठी गोळ्या झेलल्या. आणि आपण मात्र अवघ्या १७-१८ महिन्यांच्या तुरुंगवासातून सुटण्यासाठी किती अधीर झालो!!
{{gap}}विचारात हरवलेला अमन परत जागेवर आला आणि नरहरी व भैय्यांच्या खोलीकडे जाऊ लागला.
{{gap}}साठेबाबांचे पोट बिघडलेय. तेही आज जिल्हा रूग्णालयात आले होते. पहाता पहाता तिथेही त्यांचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या परीवारातील बड्यांनी... तरूणांनी तिथे धूम गर्दी केली. ती पाहता अशक्या अमनच्या कानात कुजबुजला होता.
{{gap}}'यार, तू काय बी म्हन या हापचड्डीवाल्यांची शिस्त किमान दहा टक्केतरी आपल्यात याया हवी. भैय्यांचं म्हणणं पटतं. निर्णय घेतांना समद्यांनी मिळून घ्यायचा पन राबवतांना हुकूमशाहीच हवी. बघ ना कसे पाया पडतात समदे.'
{{gap}}साठे बाबांनी साठी ओलांडलीय. पुणे मुंबईत त्यांच्या वकिलीचा प्रचंड दबदबा आहे. दहा खून केलेल्या गुंडाला सहीसलामत सोडवण्याची बौध्दिक कुवत बाबांच्यात आहे. पण खोऱ्याने येणाऱ्या पैशातील अर्धी रक्कम दरवर्षी गुरुपोर्णिमेच्या दिवशी अर्धी खाकी पैंट, पांढरा शर्ट, काळी टोपी घालून, शाखेत जाऊन पेटीत टाकतात. बाबांबद्दल परिवारात खूप आदर आहे. शौचाला जायला ते निघाले की एक स्वयंसेवक स्वतः त्यांचा डबा पाण्याने भरून आत ठेवणार. बाहेर पाण्याची बादली व साबन घेऊन उभा राहणार. बाबांचे कपडे धुण्यासाठी एक स्वयंसेवक... अशी सेवा परिवारातील जेष्ठांना की विशिष्ठ ज्येष्ठांना? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असे. पण उत्तर कोण देणार.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ११४ }}</noinclude> hrb6nqjszgenwy8fne09wytp125663d पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११५ 104 70938 155713 2022-08-13T07:19:39Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}आज सकाळी श्रीभैय्या, पन्नलाल भाऊ, बापू, अनंतराव या साऱ्यांच्याच नवाने पत्रं आली आहेत. तीही न सेन्सॉर होता... न पाकीट फोडता..
{{gap}}लोकनायक जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र आल्याशिवाय हिटलरी नकाब घातलेल्या काँग्रेसची क्रूरशक्ती चीत होणार नाही याची जाणीव जयप्रकाशींच्या पत्रांतून होती आणि त्यातच पक्षाचे व दलाचे पत्र होते. दोन भिन्न भूमिका आणि विचारानीती असणाऱ्या धारा एकमेकीत संपूर्णपणे मिसळून नवा संघटित समर्थ पक्ष म्हणून उभा राहू शकेल का, यावर मते मागवली होती.
{{gap}}गेल्या चौदा महिन्यापासून बापू, अनंतराव यांच्या गटात धारियांची भर पडली आहे. धारिया, चंद्रशेखर ही बाईंच्या 'किचन कॅबिनेट' मधली तरूणतुर्क मंडळी... म्हणजे पन्नाशीतली. अत्यंत साधे, सतत हसतमुख असलेले धारियाजी आपली वैचारिक भूमिका अत्यंत मधुर पण ठाम शब्दांत समोरच्यांच्या मनी उतरवीत असत. श्रीकृष्णाचा जन्म जसा कारागृहात झाला तसाच नव्या जनतादलाचा जन्म कारागृहात होण्याचे वातावरण तुरुंगात होत होते. तुरुंगाच्या बाहेरही वातावरण उत्साहाने बहरले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात नव्या आशा, आकांक्षा तरळू लागल्या होत्या. तुरुंगातील परिवर्तनवादी आणि लोकशाही समाजावादावर निष्ठा व श्रद्धा असणाऱ्या नेत्यांनी बौद्धिकातून मांडलेले विचार श्रीनाथच्या मनात सतत पिंगा घालित होते.
{{gap}}"...आपण नव्या पक्षाचे सभासद होणार आहोत. सभासदांची भूमिका कोणत्याही पक्षात अत्यंत महत्वाची असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सभासदांनी आपले नेते निवडायला हवेत. जेव्हा नेतेच सभासदांची निवड करून, पक्ष प्रवेश करवून घेतात तेव्हा खूपदा धोका संभवतो. एकात्मता (मोनोलिथझम्) शिस्त, उतरंड, कर्तव्य तत्परता, जबाबदारी व नेमणूकपध्दती यावर अत्यंतीक भर दिल्यामुळे विविधता, पुढाकारवृत्ती, लोकशाही, हक्क व निवडस्वांतत्र्य यांचा बळी जाण्याची निःसंशय शक्यता असते. सर्वसामान्य, दीनदलीत समाज घटकांच्या प्रश्नांची उत्तरे शोधून ती मिळवून देण्याचे 'पक्ष' हे एक ऐतिहासिक साधन आहे.
{{gap}}हे साधन वापरतांना सभासदांनी सतत सजग रहायला हवे." हे विचार श्रीनाथच्या मनात घुमत होते.
{{gap}}श्रीनाथ खूप अस्वस्थ हाता. शिस्त, उतरंड, कर्तव्य तत्परता, धर्म व जाती याबद्दल आस्था, जबाबदारी व नेमणूक पध्दतीवर अत्यंतिक भर देणाऱ्या विचारसरणीच्या निष्ठावंतांचे आणि विविधता, सर्वधर्मसमभाव, लोकशाही, विज्ञाननिष्ठा, हक्कांची जाणीव, स्त्रीपुरुष समता, साधनसशुचिता यांवर श्रद्धा असणाऱ्या निष्ठावंतांचे, दोन भिन्न प्रकृतीच्या समुदायांचे मनोमिलन होईल का? ह्या प्रश्नाने त्याच्या मनात थैमान मांडले होते. पुढचा रस्ता दिसत नव्हता. फक्त धुके होते.
<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ११५ }}</noinclude> 7ar0aefovt8kwohmgpcytv873vumicz पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११६ 104 70939 155714 2022-08-13T07:26:11Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}त्याने हातात कागद घेतला. त्यावर तो एकाग्रपणे लिहित होता. हे पत्र त्याने काळजीपूर्वक पाकिटात बंद केले आण एसेम् अण्णांच्या नावाने पोस्टात टाकण्यासाठी अशोक अमन जवळ दिले.
{{gap}}प्रत्येक दिवस लवकर उजाडणारा आणि रात्र ही उजेडासारखी प्रकाशणारी. त्यात डिसेंबरच्या अखेरीस इंदिराजींनी आणीबाणी रद्द करून निवडणूका घेण्याचा मनसुबा जाहीर केला. अर्थात, लोकनायक जयप्रकाशजींनी निवडणूकीत सहभागी होण्याचे आश्वासन दिले तरच! हजारो तरूण, स्त्रिया, पुरुष कार्यकर्ते अनेक महिन्यांपासून गजाआड डांबलेले. त्याची सुटका व्हावी या सदहेतूने जयपक्राशजींनी इंदिराजींना संमती दिली. मात्र दुसऱ्या स्वातंत्र्यासाठी वाट्टेल ते समर्पण करायची तयारी असलेले काही तरूण मात्र जयप्रकाशजींवर काहीसे नाराज झाले. या निवडणूका दबावाखाली पार पाडल्या जातील. आणि मग, 'लोकशाही' च्या जगजाहीर मुखवट्या आडून बाई निरंकुश हुकूमशाहीचे सूत्र हाती घेईल ही तरूणांना भीती होती. अशातऱ्हेची हुकूमशाही अधिक घातक ठरेल असे या तरूणांना वाटत होते. १५ जानेवारीपासून राजकीय मिसाबंदीना सोडण्यास सुरुवात झाली. नाराज तरूणांचे मनोबल वाढवून निवडणूकीचे आव्हान एकत्रितपणे स्वीकारण्याची तयारी तुरुंगातील विचारवंतांनी केली.
{{gap}}अमन, अशोक, नरहरी अण्णा, डॉक्टर, श्रीनाथ यांचा नंबर तसा उशीराच लागला. २५ ला सायंकाळी ते सुटले. पण त्याआधी सुटलेल्यांनी ही मंडळी २५ तारखेला सुटणार असल्याची खबर घरच्यांना... गावांना दिली होती. सुधीर, बन्सीबरोबर अमन मुंबईला गेला. तेथे मायकेलने एक बैठक बोलविली होती. तसेच परतांना तो पुण्याला जाणार होता. शनिवारावाड्यासमोरची भव्यसभा त्याला ऐकायची होती. आंतरभारती परिसरात जाऊन अनेकांना भेटायचे होते.
{{gap}}श्रीनाथ, अशोक, नरहरीअण्णा आदींनी सकाळची नासिक लातूर एसटी गाठली. केजची मंडळी केजला उतरली. जिंदाबादच्या घोषणांनी एसटी स्टँड गजबजून गेला होता. आता मात्र अंबाजोगाई कधी येईल असे प्रत्येकाला वाटत होते लोखंडीसावरगाव मागे पडले आणि एस्टी अंबाजोगाईच्या बसस्थानकात शिरली. लोकूने हात हालवला आणि तो गाडीकडे धावला.
{{gap}}जनक चांगलचा उंच झालाय. पांढऱ्या शुभ्र नेहरूशर्ट पायाजम्यात किती छान दिसतोय! इराने झालीरी झालरीचा पांढरा शुभ्र झगा घातलाय. आईला...अनूला चिटकून बाईसाहेब उभ्या आहेत. फिकट निळ्यासुती साडीतली अनू. नरहरीअण्णांची पत्नी लक्ष्मीवहीनी, त्यांचा भाचा, मेहुणा, अमनचे आब्बा, अशोकची आई, वडील भाऊ.... प्रकाश, देवठाणचे गोविंददादा खरातभाऊ अशी अनेकजण आणि शेकडो नगरवासी. प्रत्येकाच्या डोळयात उत्सुकतेचा महासागर. पण जवळच्यांच्या डोळयात<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ११६ }}</noinclude> ez3lqr1ld7ormjdbf4dui5frwbnsps9 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११७ 104 70940 155715 2022-08-13T07:33:40Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>मात्र जीवघेणी प्रतिक्षा. श्रीनाथने इराला उचलून घेतले. एकमेकांचा निरोप घेऊन प्रत्येक मुक्त राजबंदी घराच्या दिशेने नातलगांच्या घेऱ्यात चालू लागला. तेवढयातही श्रीनाथच्या लक्षात आले की अनूचे केस खूप कमी झाले आहेत. अधून मधून पांढऱ्या रेषाही डोकावायला लागल्या आहेत. आम्ही विवाहित पुरुषांच्या बंदिवासापेक्षा आमच्या पत्नीचा बंदीवास किती जीवघेणा असेल !!
{{gap}}... लांबचा वळसा घेऊन ठरलेल्या जागेवर एसटी उभी राहिली. श्री गाडीतून उतरला आणि त्याने ईराला उचलून घेतले आणि जनकला जवळ ओढून घेतले. जनकही बापासारखा उंच होणारेय. नरहरी अण्णांची लहानखोर चणीची पत्नी आपल्या भाच्याला, शंकऱ्याला घेऊन आली होती. शंकऱ्याला जवळ घेत नरहरी अण्णा वहिनीकडे पहात अतीव सहानुभूतीने म्हणाले 'शंकऱ्या संपली बरका तुमची शिक्षा.' अब्बा व रेहानाला अमन पुण्याला गेल्याचे व दोन दिवसांनी येणार असल्याचे सांगून श्रीनाथ, मुले व अनू घराकडे निघाले. पक्या, लोकू, खेड्यातील मंडळींनी श्रीनाथला आणि इतर सगळ्यांना हार घातले, पेढे दिले आणि स्टँड रिकामा झाला.
{{gap}}जिन्यातच मोहिते काकांनी अडवले,
{{gap}}"अनू, श्री भैय्या उभे रहा. आमची बायको भाकरतुकडा ओवाळून टाकणारेय. आमी सांगली सातारची माणस थोडी जुन्या वळणाची म्हणा की, अन हातपाय धून थेट इकडे घरी यायचं. तुमच्या वहिनींनी फर्मास पोहे बनवलेत." काकांनी फर्मान सोडले होते.
{{gap}}ईरा आणि जनकला झोपवून श्री अनूजवळ आला. अनूच्या मांडीवर डोके ठेवले. अनू त्याच्या केसातून हात फिरवतेय. दोघांना कधी झोप लागली कळलंही नाही. श्री जागा झाला. अनू भिंतीला टेकून गाढ झोपली होती. त्याने अलगदपणे तिला गादीवर नीट झोपवले. आज मन तृप्त झालं होतं. लग्नापूर्वीचे दिवस श्रीनाथला आठवले. अनू कवितांच्या ओळीतून मन मोकळं करत असे. {{center|<poem>"डोळ्यात वाच माझ्या, तू गीत भावनांचे शब्दांविना कळावे संगीत लोचनांचे"...</poem>}} {{gap}}स्त्री स्पर्शातून मिळणाऱ्या तृप्तीपेक्षाही नजरेतून मिळणाऱ्या अपार विश्वासाचा स्पर्श अधिक परिपूर्ण करणारा असतो.
{{gap}}आज त्या परिपूर्ण तृप्तीचा आनंद मनभर रूमझुमत होता. प्रौढत्वाकडे झुकणारे शहाणपण आता केसातही चमकू लागलेय. अनूच्या घनदाट केसात अधूनमधून चमकणारे पांढरे केस पाहून त्याला हसू आले. {{Css image crop |Image = शोध_अकराव्या_दिशेचा.pdf |Page = 117 |bSize = 393 |cWidth = 38 |cHeight = 21 |oTop = 537 |oLeft = 314 |Location = right |Description = }}<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ११७ }}</noinclude> qt4jcmpt1kc31s4cgvbz2qmws5tgss9 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११८ 104 70941 155716 2022-08-13T07:39:54Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude> {{center|{{x-larger|'''१०.'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}निवडणूका जाहीर झाल्या आणि ऋतूच बदलला. एक दिवस आंब्याच्या झाडाखाली कॉलेजमधल्या मुलींचा घोळका अनूची वाट पहात उभा होता. या झाडाला डिसेंबर अखेरीच मोहोर येतो. जणु थंडीच्या हुडहूडी स्पर्शाने अंग रेशमी काट्यांनी बहरून जावे. आणि आता तर ही पानेही झाडे बाळकैऱ्यांचे चिमणे डूल फांद्यावर झुलवीत उभी आहेत. जानेवारी संपत आला की अनूची नजर या बाळकैन्यांना शोधू लागते. ती त्या नादातच तिची सायकल घ्यायला सायकल स्टँडकडे आली आणि मुलींनी तिला घेरल.
{{gap}}"मॅम, आम्हाला काहीतरी काम सांगा ना. कोणतंही काम, अगदी प्रचारासाठी सुध्दा येऊ आम्ही. नाही का ग? या निवडणूकीत बाई हरायलाच हवी.' एक कन्या
{{gap}}"मॅडम आई म्हणत होती, की निवडणुकीत मतदारांची नावे नि नंबर लिहून चिट्टया तयार कराव्या लागतात. नि त्या वाटाव्या लागतात. लोकसभेची निवडणूक म्हणजे तर चिठ्यांचा ढीगच घालावा लागेल. आम्ही ते काम नक्कीच करू होय ग मिनू?' दुसरी कन्या. अनूने हसून हो... हो म्हणत सायकल काढली. फाटकात मुलांच्या गटाने अडवले. कुरळ्या केसांचा, उंच बांध्याचा यशवंत पुढे आला.
{{gap}}"मॅडम आम्ही मुलांनी ठरवलयं. आगदी परीक्षा पणाला लावून इलेक्शचं काम करायचं. दोन अडिचशे मुलं सायकली घेऊन आणि भाकऱ्या बांधून तालुका पिंजून काढू. प्रचाराला, पोस्टर्स लावायला, भिंती रंगावायला...'
{{gap}}'आणि भाषणासाठी घसा साफ करून ध्यायालाही आमी तयार हाव. हो रे जन्या?' यशवंताचे वाक्य अंगदाने पर्ण केले.
{{gap}}'मॅडम, तुम्ही श्री भैय्यांना सांगून कॉलेज स्टुडंटसची मिटींग घ्यायला लावा ना.<noinclude>{{rule}}{{center|शोध अकराव्या दिशेचा / ११८ }}</noinclude> mksyqvx9ipnvejgnwod7ok8p02o7lp5 पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११९ 104 70942 155717 2022-08-13T07:42:01Z अश्विनीलेले 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ अभाविप, एसेफाय, राष्ट्रसेवादल, समाजावादी युवजन... अगदी सगळ्या संघटनांचे विद्यार्थी एकत्र येऊन युवक काँग्रेसच्या नावाने हल्ला बोल करू. मॅम, तुम्ही पुढाकार घेतलात ना तर पोर..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="अश्विनीलेले" /></noinclude>________________ अभाविप, एसेफाय, राष्ट्रसेवादल, समाजावादी युवजन... अगदी सगळ्या संघटनांचे विद्यार्थी एकत्र येऊन युवक काँग्रेसच्या नावाने हल्ला बोल करू. मॅम, तुम्ही पुढाकार घेतलात ना तर पोरी सुध्दा आपोआप सामील होतील.' आणि विद्यार्थ्यांच्या मनासारखे झाले. अनुराधाने गावातील सर्व स्तरातील महिलांना प्रचारासाठी रस्त्यावर उतरवले होते. पन्नाशीतल्या निर्मलाताई, साठी पार केलेल्या माई सगळ्याजणी आपापल्या गल्लीत, मोहल्ल्यात फिरत. संक्रातीच्या वाणासाठी बायकांनी पत्रकांबरोबर वस्तू वाटल्या अनकीनी ते पैसे आप्पांच्या निवडणूक फंडासाठी दिले. सत्तर बहात्तरच्या दुष्काळात श्रीनाथने पालथी घातलेली खेडी अनूला निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने पहाता आली. डोंगर पिंपळ्याचा उभा दगडी चढाव. त्या वरून जातांना जीपही अडली. सगळेजण खाली उतरून चढाव चढून वर आले. सातवर्षांपूर्वी श्रीनाथ, अशक्या, अण्णा सायकलवरून कसे जात असतील याचा अनुभव तिने कल्पनेनेच घेतला. त्याच्या पुढची दगडवाडी, पहावे तिथे दगड. फक्त दगडच. पुढचा उतार उतरून आल्यावर दहावीस झोपड्यांचं चिंचाळं. डाव्या हाताला वळून निळाईचं वाळूचं रूंदपात्र ओलांडून पुढचा चढाव चढून गेलं की देवठाण. या कोरड्या ठणणं निळाईने देवठाण्याला जणु कवेत घेतलेय. पुन्हा चढाव उतरून निळाईचं वाळूने भरलेलं कोरडं पात्र पार केलं की येल्डा खेडे लागते. इथून तिथून उजाड उदास डोंगर. झाडी झाडोरा शोधून सापडणार नाही. नाही म्हणायला चार दोन वेड्या बाभळी दिसंत. ... येत्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र मिळून तीसवर्षे होतील. पण स्वातंत्र्याचा अंधुकसा प्रकाश किरण पोचल्याची एकही खूण या गावांमधून दिसत नाही. हे तिला जाणवले. चढ चढून ते देवठाण्यास आले. गावातल्या मांगवाड्यातल्या विहिरीलाच पाणी होते. एका लहान मुलीला बादलीत बसवून विहिरीत उतरवून ती वाटी वाटीने घागरीत पाणी भरीत होते. श्रीने सातवर्षांपूर्वी जे अनुभवले तेच आजही. राजकारणी बदलले तर हे सारे बदलेल का? की मागच्या पानावरुन पुढे चालू...?... अनुराधाच्या मनात विचार येत होते. खरातकाकांनी चहा घ्यायला घरात बोलावले. गावात फेरी मारून येतो, असे सांगून अनू आणि मंडळी पुढे सरकली. 'आक्का मत कोणाला देणार?' असे घरातल्या बाईला विचारले की ती तोंडाला शोथ अकराव्या दिशेचा / ११९<noinclude></noinclude> 41hoa79z88b3bqjn2z81mxr2mn4w5il