विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.25 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk विकिस्रोत:चावडी/तांत्रिक प्रश्न 4 2561 155832 155827 2022-08-21T03:43:02Z QueerEcofeminist 918 /* मोठ्या प्रमाणात ओसीआर करण्याची आवश्यकता */ wikitext text/x-wiki == आंतरविकि आयात सुविधा कार्यान्वित करणे प्रस्ताव == {{Discussion top}} नमस्कार, मराठी विकिपीडियावर [[:w:mr:वर्ग:Transferable to Marathi Wikisource]] तसेच मराठी विकिबूक्सवर या वर्गीकरणाने वर्गीकृत होणारी मराठी विकिस्रोत प्रकल्पात स्थानांतरण योग्य लेखपाने वेळच्या वेळी इतिहासासहीत स्थानांतरीत (आयात) करता यावीत, तसेच साहाय्यपाने आणि साचे आयात करता यावीत तसेच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी विकिस्रोत, प्रकल्पातील लेखपाने वेळोवेळी गरजेनुसार अनुवादासाठी सहजपणे आयात करणे प्रचालकांना सुलभ जावे म्हणून आंतरविकि आयात सुविधा कार्यान्वित करण्याबाबत प्रस्ताव मांडत आहे. [[सदस्य:Mahitgar|Mahitgar]] ([[सदस्य चर्चा:Mahitgar|चर्चा]]) २२:२९, १ जुलै २०१५ (IST){{Discussion bottom}} ==मराठी विकिस्रोतवर आयात== {{Discussion top}}मी मराठी विकिस्रोतवर इंग्लिश विकिपीडिया व विकिमीडिया कॉमन्स वरून पाने आयात करण्यास [https://phabricator.wikimedia.org/T188486 प्रस्ताव] मांडला आहे. कृपा आपले मत खाली नोंदवे --[[User:Tiven2240|'''टायवीन'''२२४०]][[User talk:Tiven2240|माझ्याशी बोला]] १४:३९, २८ फेब्रुवारी २०१८ (IST) {{Discussion bottom}} ==Wikisource Pagelist Widget== {{Discussion top}} {{ping|QueerEcofeminist}}, Could you please install the Wikisource Pagelist Widget to Marathi Wikisource as you now interface admin. It will help community works better to creating Pagelist OOUI widget without input any code. The [https://www.mediawiki.org/wiki/Help:Extension:ProofreadPage/Pagelist_widget technical documentation here] for ready reference. Most of all Wikisource installed it already. * https://meta.wikimedia.org/wiki/Wikisource_Pagelist_Widget [[सदस्य:Jayantanth|Jayantanth]] ([[सदस्य चर्चा:Jayantanth|चर्चा]]) २१:४८, १२ जुलै २०२१ (IST) :{{done}}, Please check once and let me know, if anything else is needed. Thanks a ton for helping us, you have been a great help to mrwikisource community. [[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] ([[सदस्य चर्चा:QueerEcofeminist|चर्चा]]) ००:३७, १३ जुलै २०२१ (IST) :: Thanks, let me check. [[सदस्य:Jayanta (CIS-A2K)|Jayanta (CIS-A2K)]] ([[सदस्य चर्चा:Jayanta (CIS-A2K)|चर्चा]]) १०:१६, १३ जुलै २०२१ (IST) {{Discussion bottom}} ==मराठी विकिस्त्रोतावर घाऊक ओसीआर अवजार आणण्यासाठी मतदान == === मोठ्या प्रमाणात ओसीआर करण्याची आवश्यकता requirements for mass ocr tool === * सध्या आपल्याकडे स्केन केलेल्या पुस्तकांचा ओघ खुप मोठा आहे, शिवाय त्यावर काम करणारे कुशल सदस्य कमी आहेत. * ओसीआर तयार मिळाल्यास पुढील काम खुप सोपे होते आणि त्यामुले नवी पुस्तके लवकर तयार व्हायला मदत होईल. * आपण या आधी [[https://github.com/tshrinivasan/OCR4wikisource|OCR4wikisoruce]] हे अवजार वापरत होतो पण ते बंद पडल्याने आता आपले काम रखडले आहे. ===प्रस्तावित अवजार === * This tool should be able to OCR a whole book in one go. So that we have saved OCR pages as a product. * Use of tool should be limited to bot accounts. * As a input we will give name of the index to be ocred, range of pages and the tool will produced OCRed Pages. ===आपली मते प्रश्न/सुचना येथे मांडा === [[वर्ग:विकिस्रोत व्यवस्थापन]] js41vjjqrj5pxl8aebnyyjzomlacec9 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३६ 104 71025 155828 2022-08-20T13:58:46Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 36 |bSize = 374 |cWidth = 329 |cHeight = 200 |oTop = 47 |oLeft = 32 |Location = center |Description = }}  {{gap}}०१ मे १९६१ ची संध्याकाळ राष्ट्र सेवा दल कलापथकाचा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा नृत्यनाट्य संगीतावर आधारित कार्यक्रम हैद्राबादला खुल्या रंगमंचावर सादर होत होता. प्रमुख अतिथी मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे सेनानी स्वामी रामानंद तीर्थ समोर बसलेले. अधुक्या उजेडात संत तुकाराम टाळ चिपळ्यांवर अभंग आळवताहेत. {{center|'''कन्या सासुरासी जाये, मागे परतोनी पाहे
तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा'''}}{{gap}}मागे पांढराशुभ्र छाया नाट्याचा... शॅडोप्लेचा पडदा. त्यावर छाया दिसताहेत. अंगावर शेला, मुडांवळ्या, नऊवारी लुगड्यातली नववधू. मागे वळून पहातेय. तिचा शेला पांघरलेला हात आर्ततेने आईकडे ओढ घेतोय. आईचा एक हात, सोडून जाणाऱ्या लेकीची समजावणी करतोय. तिच्या दिशेने दिलासा देत झेपावतोय. मंदिल बांधलेला पुढे ओढ घेणारा ताठ नवरदेव. त्याच्या उपरण्याला शेल्याची बांधलेली गाठ. ओढली जाणारी. छाया नाट्यातल्या सावल्यांचा खेळही विलक्षण बोलका. स्नेहल भाटकर किंवा शरद जांभेकरांचा भावगर्भ स्वर. शिवाशी एकरूप व्हायला आतुरलेल्या जीवाच्या मनाची तगमग.
{{gap}} स्वामीजींच्या डोळ्यातून घळघळा पाणी ओघळत होते.
<noinclude>{{rh|२२ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> iwuq5vgzqtq7pwksejnewqf3zojgupn पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३७ 104 71026 155829 2022-08-20T14:13:36Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}६ मे ला कलकत्त्याला प्रयोग होता. हैद्राबाद ते कलकत्ता सुमारे दीड हजारापेक्षा जास्त किलोमीटर्स चे अतंर. राजमुंडीच्या अलिकडे गोंदावरी अनेक हातांनी बंगालच्या उपसागराला भेटायला धावू लागते. या प्रवाहांवर ॲनिकट नावाचा सात किलामीटर्सचा पाणरस्ता आहे. हे प्रवाह खोल नसतात. तिथे कमी उंचीचे पूल. जमिनीवर किंचित उंच पक्का रस्ता. सायंकाळी हे रस्ते बंद केले जातात. आम्ही तिथे पोचलो तर अनेक वाहने आमच्यापुढे. संध्याकाळ झाली. आपण राजमहेन्द्रीला पोचू या हिशेबाने. जवळ खाण्यासाठी फक्त चुरमुरे अलिकडच्या लहान गावातल्या डाक बंगल्यात आमचा मुक्काम. रात्री अचानक अवकाळी पाऊस आभाळ कवेत घेऊन कोसळू लागला. सकाळी नवे संकट समोर. ॲनिकट पार उध्वस्त झालेला. ०३ मे ची सकाळ. ०६ मे ला कलकत्ता गाठायचे. कवी वसंत बापट, लिलाधर हेगडे, वर्देकाका सगळेच अस्वस्थ. इतक्यात समोरून एक माणूस तराफ्यावरून नदी पार करून आला. लगेच बापटकाका धावले. तो अधिकारी होता. त्याच्याशी विनवणीवजा चर्चा. यशवंतरावजी, काकासाहेब गाडगीळ यांची ओळख वगैरे. मग त्याने एक प्रचंड मोठा तराफा मागवला. तो तराफा. त्यावर आमची साठमाणसांची बस. त्यात आम्ही. हलायचे नाही. बोलायचे नाही या सूचना. एकदाचे आम्ही पल्याड पोचलो. राजमहेन्द्रीत उपाशी पोटांनी भरगच्च जेवून पुन्हा प्रवास सुरू. घनदाट जंगलातून. वाटेत एक भलामोठा जाडजूड पिवळा अजगर उजवीकडून डावीकडे गेला. बस बऱ्यापैकी वेगात, ब्रेक मारला तरी तो जखमी झाला. गाडीच्या ड्रायव्हरनी गाडी थांबवली. जखमी अजगर दूर जाऊ शकत नाही तो मरतोच, आणि तसेच झाले. एवढा प्रचंड अजगर पुन्हा कधी पाहणार? राणीची बाग नाहीतर सर्पसंग्रहालयात. पण ते पिंजऱ्यातले. ओरिसात महाकाय महानदीने अडवले. तिथेही तराफा नाट्य. सततचा प्रवास. पोटात न मावणारी भूक..असनसोल जवळच्या पेट्रोलपंपावर प्रत्येकी अर्धा पराठा, एक लोणच्याची फोड नि बटाट्याच्या भाजीचे दोन तुकडे यावर भूक भागवली. कलकत्ता गाठेस्तो संध्याकाळचे चार वाजलेले. पूर्वेकडे पाचलाच अंधारते. महाराष्ट्र मंडळाने सगळ्या खोल्या उघडून दिल्या. मग आंघोळी. थोडेफार खाणे. आणि ठीक ०६ ला पडदा वर गेला. त्या दौऱ्यातला तो सर्वोत्कृष्ट कार्यक्रम...
{{gap}}४७ वर्षापूर्वी ०१ मे १९६० ला महाराष्ट्र दर्शनचे पहिले सादरीकरण दिल्लीत झाले. सुरूवात पहाटे येणाऱ्या जागल्या... मागत्यांपासून होई. मग त्यात वासुदेव, . वाघ्यामुरळी, जोगी असत. २ तास ५० मिनिटांचा बांधीव, आखीव, रेखीव कार्यक्रम. रचना कविवर्य वसंत बापट यांची. संगीत दिग्दर्शन वसंत देसाईंचे. महाराष्ट्राच्या संस्कृती दर्शनात मंगळागौरीच्या निमित्ताने रात्रीच्या जागरणात खेळले जाणारे विविध खेळ.<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / २३}}</noinclude> qux60zk1bgad57sywarwydy5lrvctfv पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३८ 104 71027 155830 2022-08-20T14:22:37Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>फुगड्यांचे प्रकार... पिंगा... खुर्ची का मिरची हा नववधूला फेरात अडकवून, तिला बाहेर न जाऊ देण्याची कसरत, सासुरवाशिणी, लेकी, वयस्क सासवा... काक्या, माम्या अशा समस्त महिलांना अंतर्बाह्य मोकळे करणाऱ्या खेळांचा समावेश असे. नाव घेण्याचा (अर्थात पतीचे) कार्यक्रम असेच. आज ते खेळ उखाणे पार अंधारात पुरले गेले आहेत.
{{gap}}मग एकनाथांचे भारूड, ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, नामदेवांच्या अभंगाची, स्वामी समर्थांच्या दासबोध यांची चित्रमय, संवादमय दखल. पंतांच्या कवितेतील हंसांच्या क्रिडेचे नृत्यमय दर्शन. सुटुनि खग पळाला, बैसला शाल शाखे... हे नृत्य सुधाताईची चिंटुकली झेलम नि आवाबेनची माणिक करत असत. आज झेलम ओडिसी नृत्याची प्रख्यात जाणकार, अदाकार आहे. रामजोशीच्या वेशातले उमदे बापटकाका. 'सांग सखे सुंदरी कुण्या ग सुभगाची मदन-मंजिरी' या लावणीच्या ठेक्यावर नाचणारी आमची सुधाताई (वर्दे) ती नाचू लागली की लय अक्षरश: तिच्या नृत्याविष्कारातून लवलवू लागे. शाहीर लिलाधर हेगडे पठे बापुरावांचा पोवाडा सादर करीत. बैठकीची लावणी ही महाराष्ट्राची खासियत.{{center|'''पाऊस वर पडतो, सख्या रे रात्र अशी अंधारी
भिजत मजसाठी तू उभा केव्हाचा दारी...'''}}{{gap}}अत्यन्त करूणार्त स्वरात गाणारी लीला. अनुताई किंवा मी. महाराष्ट्रातल्या लोकनृत्यांची अधून मधून पेरणी. देव पावला देव माझा मल्हारी हे कोळीगीत. नाचणाऱ्यात रामनगरकर.
{{gap}}महाराष्ट्राला सुफलित करणाऱ्या नद्या. कृष्णा तापी, गोदावरी, प्रवरा, भीमा... त्यांची वैशिष्ट्ये अवघ्या दोन ओळीत रेखाटनारे भरतनाट्यम शैलीवर वर आधारित अतिशय देखणे नृत्य. तारपा या वाद्यावरचे आदिवासी नृत्य.
{{gap}}महाराष्ट्राला अस्मिता देणारे म. फुले, आगरकर, टिळक आदींची त्यांच्या विशिष्ट वाक्यांच्या अभिव्यक्तीतून झलक. केशवसुतांच्या नव्या मनूचा शिपाई' या कवितेचे समुहाने सादरीकरण. बालकवींची 'कुणी नाही ग कुणी नाही आम्हाला पाहत बाई.' ही चांदण कविता नृत्यातून सादर.
{{gap}}मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली. कोकणातली अनेक कुणबी समाजाची मुले 'रामागडी' होऊन मुंबईत येतात. इथेच संसार थाटतात. होळी... रंगपंचमीच्या काळात ते महाभारतातली सोंगे घेऊन घरोघर फिरतात. त्यांचे बालीनृत्य सादर केले जाई. अर्धी विजार, वर चटेपटेरी बनियन, गळ्यात रंगीबेरंगी रूमाल, पायात घुगरु. हे<noinclude>{{rh|२४ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 7xrmwx8v2la3i2j4m3c9wv8dkrny3gp पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/३९ 104 71028 155831 2022-08-20T14:30:39Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>नृत्य एकमेकांच्या हातात हात घालून गोलाकारात असते. मध्येच गोलांची दिशा बदलते. त्याची लयच अन कोकणी गीत ही त्यांची खासियत. 'गणराया पडतो पाया पडतो पाया धावत येरे मती मला देरे. येऊन सभेच्या ठाया...' हे नृत्य महाराष्ट्र दर्शनमध्ये होते आणि शेवटी गणेशोत्सव आणि लेझिम. मराठी संस्कृतीचा गाभा.
{{gap}}महाराष्ट्र दर्शनची सुरवात कवी वसंत बापटांच्या गर्जा जयजयकार, जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हा गर्जा जयजयकार' या गीताने होई. {{center|'''जय वऱ्हाडचे आजोळ, जय अजंठानि वेरूळ
जय बारा मावळ बाई जावळ खानदेश सातार...'''}}{{gap}}संपूर्ण महाराष्ट्राचा सांस्कृतिक आलेख संयत शब्दांतून त्यात रेखाटला होता. तर शेवटी त्यांचेच गीत.
'''जय हिंद हिंद, आनंदभुवन, जय भारतवर्ष महान{{gap}}॥धृ॥
हा रजत शिखरधर गिरिवर सुंदर उत्तरेस हिमवान
हे नील गगन गत चक्र सुदर्शन तळपत वरि भास्वान्
हे चन्द्रचलित जल उर्मिल सागर मंद्रगाती मधुगान...'''
{{gap}}हे गीत होई व २ तास ५० मिनिटांची सांस्कृतिक झलक संपे...
{{gap}}गेली अनेकवर्षे प्रत्येक महाराष्ट्र दिनी अनेक सेवादल सैनिकांच्या कलाकार... गायक... तंत्रज्ञ... यांच्या मनात महाराष्ट्र दर्शन' जागे होते. साठी ओलांडली तरी जुन्या आठवणींनी मन शहारून जाते आणि बहारून जाते.
{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / २५}}</noinclude> hu5y3l3nrf3jbexdb4ifq2cgfgvqlaz पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४० 104 71029 155833 2022-08-21T07:32:35Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 40 |bSize = 390 |cWidth = 320 |cHeight = 204 |oTop = 39 |oLeft = 30 |Location = center |Description = }}  {{gap}}उमलत्या वयात 'का' हा प्रश्न मेंदूत उगवला की मनाच्या क्षितिजात नवनव्या चांदण्या चमकू लागतात. त्या मिणमिणत्या प्रकाशामागच्या शोधाचा ध्यास लागतो. ..माझे आजोबा असेपर्यन्त सण-वार माहेरच्या समाजवादी घरात खाण्यापुरते साजरे होत. नागपंचमीला तांदुळाच्या रव्याची खमंग खांडवी होत. कोकणात व देशावरही या दिवशी चुलीवर तवा चढवत नाहीत. पंचमीच्या आधीपासून रात्री गल्लीतल्या महिला एकत्र जमत. फेर धरून गाणी म्हणत. मराठा, माळी, साळी, ब्राह्मण.. सर्व जातीच्या बाया हातात हात घालून फेर धरीत. नंतर आमची लाडकी भुलाबाई भाद्रपद पौर्णिमेला घरी येई. कोनाड्याला मखर लावून, तोरण बांधून तिला, तिच्या भुलाजीला आणि त्यांच्या गणेश बाळाला, त्यात 'बसवले जाई' मग सर्व जातीजमातीच्या मुली सायंकाळी शाळा सुटल्यावर एकीमेकींच्या घरी टिपऱ्या घेऊन फेरधरून गाणी म्हणायला जात. चारपाच गाणी म्हटली की खाऊ मिळे. अर्थात् आधी तो ओळखण्याचा विधी असे. सात आठ घरचे नवनवे खाऊ खाऊन घरी येई पर्यन्त रात्रीचे आठ वाजून जात. मंगळागौरीची पूजा. मैत्रिणीच्या घरी नव्या नवलाईच्या भावजयीची नाही तर काकूची मंगळागौर असे. मग फुलं, दुर्वापत्री गोळा करून सुंदर सजावट करण्याची, संध्याकाळच्या फराळाची, रात्रीच्या जागरणाची नि सूप नाच, फुगड्या झिम्मा, 'खुर्ची का मिर्ची' खेळत नवविवाहितेला फेरात अडकवून नाचण्यात व तिला फेरा बाहेर पळू न देता नाव घ्यायला (अर्थात नवऱ्याचे) लावण्यात वेगळीच धमाल असे. या फेरात सत्तरी गाठलेल्या आज्या, पणज्याही सामील होत. ही सर्वच व्रते, त्यातील खेळ, जागरण<noinclude>{{rh|२६ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 3h1pw21eshl2sbw3dhvctryic1r7aj5 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४१ 104 71030 155834 2022-08-21T07:49:16Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>यातही एकत्र येऊन खेळण्यावर भर असे. तेव्हापासून स्त्रियांच्या व्रतांतली, विधींमधली सामूहिकता मनाला आगळी वेगळी वाटत असे.
{{gap}}विवाहानंतर आंब्याला आले. माहेश्वरी... राजस्थानी घरातील सून म्हणून. तिथेही स्त्रियांच्या नव्या विधी, व्रतांचा अनुभव सहभागी होऊन घेतला. महाराष्ट्रपासून दक्षिणेकडे सर्वसाधारणपणे अमावस्येनंतर नवा महिना सुरू होतो. तर उत्तरेकडे पौर्णिमेनंतर सुरू होतो. फाल्गुनी पौर्णिमेनंतर चैत्र सुरू होतो. तर महाराष्ट्रात फाल्गुनी अमावस्येनंतर.
{{gap}}...होळीच्या दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करणाऱ्या दादीजी घरातली मोठ्ठी कढई डोक्यावर पालथी घालून लगबगा मोठ्या घरी आल्या.
{{gap}}'बाई' सुवारं गौर बेठवाळी हं. थाकी नई देवरानी पूजा करी कांई?'
{{gap}}'न कराया काय झालं? आता आपली झालीये ना? सगळं करील.' भाभीजींचे उत्तर. मग बड्डी तीज.. हरियाली तीज, शिळा सात, गणगौर यांत मीही उत्सुकतेने सामील झाले.
{{gap}}वर्षे भरारा भरारत होती. लोकसाहित्य, त्यातील स्त्रियांची व्रते, विधी, गाणी यांत मन गुंतले आणि विशेष अभ्यासाचे शोधनाचे क्षेत्र म्हणून 'स्त्रियांची विधी, व्रते, उत्सव यातील सामूहिकता' हा विषय निश्चित केला.
{{gap}}फाल्गुन उजाडला की घरादारातील पोरीसोरींना आणि नव्यानवेल्या 'बिनणीनां' गोर पूजण्याचे ...त्यासाठी माहेरी जाण्याचे वेध लागत. सुहासिनीही गणगोरीची आतुरतेने वाट पहात. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे उत्तरेतल्या.. राजस्थानातल्या चैत्र प्रतिपदेच्या दिवशी गोर (गौर) माहेरपणाला येते. होळीची राख सुफलनासाठी अत्यन्त चांगली. या राखेचे १६ मुटके, शेणाचे १६ मुटके करतात. भिंतीवर ओल्या हळदी कुंकवाचे १६/१६ ठिपके रेखाटतात. त्या खाली ते मुटके मांडतात. ते गौरीचे प्रतिक. पहिल्या दिवशी गव्हाच्या नव्या ओंब्यांनी, दुसऱ्या दिवशी हळदीने पूजा करतात. सातव्या दिवशी भिंतीवर काजळाचे १६ ठिपके मांडून खाली दोन कुंड्या वा मडकी काव, चुना यांनी सुंदर रंगवून त्यात होळीची राख शेण, माती घालून, त्यांत गहू, साळ, सरकी, ज्वारी, तूर, हरभरा अशी सात प्रकारची धान्य पेरतात, आणि गौरीच्या मुटक्यांजवळ ज्वारीचे कणिस त्याला पांढरा दोरा बांधून उभे करतात. तो 'ईसर' म्हणजे ईश्वर.. शंकर. त्याच्या जवळ दुसरे कणिस, त्या कणसाला केसाचा गुंता आणि लाल पिवळा शुभकारक दोरा बांधतात. त्याला मोळी म्हणतात. ते कणिस..ती गौर... गौरी.<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / २७ }}</noinclude> laqy7aptv805he2fqu35qe5d63p1hu5 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४२ 104 71031 155835 2022-08-21T08:03:45Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>या दिवशी पाटावर नवे गहू पसरून त्यावर या कुंड्या ठेवतात. रोज पूजेनंतर जवळच्या विहिरीवर वा तळ्यावर सगळ्या जणी मिरवत गाणी गात जातात. दोन कळशात पाणी घेऊन येतात. एक शिव तर दुसरी पार्वती. ते कुंडीत टाकतात. दुसऱ्या दिवशी त्यांचे लग्न. अगदी सात फेऱ्यांसह. ज्या दिवशी महाराष्ट्रात चैत्रगौर मांडली जाते त्या दिवशी.. चैत्र शुक्ल तृतियेला, राजस्थानी गणगौर विसर्जित केली जाते. तिचे माहेरपण संपते. जातांना गव्हाच्या पिठात गूळ तूप घालून त्रिकोणी मुटके तळतात. त्याला फळ म्हणतात. गव्हाच्या पिठाच्या तळलेल्या डबीच्या आकारात सात फळे ठेवतात. त्यात फणी, काजळ कुंकवाच्या डब्या तळून ठेवतात. त्या दिवशी चंदनबटव्याची, (तो थंड असतो) भाजी करतात. न मिळाल्यास मेथी.. हरभरा.. पालक अशी हिरवी भाजी करतात. मुलीच्या विवाहानंतर या व्रताचे माहेरी उद्यापन होते. म्हणजे हे व्रत कुमारिकांचे नंतर सुवासिनींचे असते. घराला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देऊन गौर परत जाते...
{{gap}}थंडीच्या काट्याने मोहरलेली आंब्याची राने फाल्गुनच्या अखेरीस बाळ कैऱ्यांचे झुलते डूल कानात घालून वहात्या वाऱ्यासोबत ठुमकू लागतात. चैत्राचे.. चैत्री पाडव्याचे, झोक्यावर बसून हिंदाळणाऱ्या गौरीचे, त्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या महिलांना एकत्र आणणाऱ्या हळदी कुंकवाचे वेध मराठी घरातल्या नववयसा लेकी बाळींना लागतात. एकत्र येऊन फराळाचे पदार्थ, गौरीची सजावट, अंगणात रांगोळ्या घालून चैत्रांगण सजवायचे...
{{gap}}आम्ही भारतीय सण, उत्सव, विधींवर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो. काही महिने तर सण उत्सवांनी बहरलेले. श्रावण, भाद्रपद, मार्गशीर्ष, पौष, चैत्र.. यादी वाढतच चाललीय. चैत्र आला की गवरण्यांची सजावट, ओल्या हरबऱ्याची उसळ, कैरीची सणसणित फोडणीची खमंग वाटलेली डाळ, मस्त मधुर कैरीचं पन्हं. सुटलं ना तोंडाला पाणी? चैत्र म्हणजे नव्या वर्षाचं स्वागत. ते संपूर्ण भारतात विविध रितीनी होते. कश्मिरात चैत्राला चिथुर म्हणतात. पाडव्याला नवरोज किंवा नवरेह. या दिवशी सरस्वतीची पूजा करतात. आदल्या रात्री एका थाळीत तांदूळ, बदाम, दही, फुले, रूपया, आरसा, नवे पंचांग आणि मीठ ठेवतात. नवरेह रोजी घरातली सून पहाटे सर्वांना उठवते. प्रत्येकजण अन्नदेवतेला प्रणाम करतो. आरशात पाहून हसतो. वर्ष हसतमुखाने जाते. धान्यलक्ष्मीचेच नाही तर गृहलक्ष्मीचे.. घरातल्या अन्नपूर्णेचे दर्शन घेऊन नव्या वर्षाची सुरवात करावी हा हेतू.
{{gap}}तर केरळमध्ये या दिवसाला 'विषु' म्हणतात. उठल्यावर अन्नाचे.. शुभ आणि जीवन देणाऱ्या वस्तूंचे दर्शन व्हावे म्हणून रात्रीच. काशाच्या भांड्यात तांदूळ पसरून<noinclude>{{rh|२८ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 782yx4hftgp93u87jiohu1i8m6kugks पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४३ 104 71032 155836 2022-08-21T08:21:28Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>त्यावर कोन्ना नावाच्या झाडाच्या फुलांची आरास मांडतात. त्यात सोन्याचे दागिने, रुपये, मोठी पिवळी काकडी, नारळ, शुभ्र वस्त्र ठेवून दोनही बाजूंनी समया चेतवून ठेवतात. या सजावटीला 'विषुकणि' म्हणतात. सकाळी उठल्यावर पहिले दर्शन विषुकणीचे.
{{gap}}आसाम तर नृत्यसंगीताने नटलेला. पण तिथे वैशाख प्रतिपदेस नवे वर्ष सुरू होते. या दिवसाला 'रंगाली बिहू' किंवा 'बहाग बिहू' म्हणतात. कडू लिंबाची डहाळी घराघरात बांधतात. महिनाभर त्याच्या कोवळ्या पानांची गूळ घालून चटणी हवीच. बंगालमध्येही हाच दिवस नव्या वर्षाचा. वहीची पूजा करतात.
{{gap}}महाराष्ट्रातही चैत्री पाडव्याला वहीची, पाटीवर काढलेल्या शारदेची... १ हा आकडा एकापुढे एक असा, पांच..सात वेळा मांडायचा आणि वर रफार..आकृतीमय सरस्वतीची पूजा करतात.
{{gap}}'गौर' म्हणजे पार्वती, चैत्र तृतियेला ती माहेरपणाला येते. ती थेट अक्षय्य तृतियेपर्यन्त माहेरी राहून घराला अक्षय्य धान्यसमृद्धीच्या शुभेच्छा, आशीर्वाद देऊन सासरी जाते.
{{gap}}हे महिने उन्हाचे. ओरिसात तर तीन आठवडे चंदनोत्सव करतात. चंदनाचे तेल, पंखे एकमेकांना देतात. उन्हाची तलखी सुद्धा सुसह्य करण्याची रीत.
{{gap}}भारतीय सण खानपानाच्या रितीभातीतून सामाजिक आरोग्याची, ऋतूमधील बदलत्या निसर्गाच्या स्वागतास, धान्यलक्ष्मीशी जोडलेले आहेत. कडुलिंब आरोग्यदायी, गूळ थंड, कैरी चवदार.. भूक वाढवणारी. या सुमारास गहू, मोठी ज्वारी यांची खळी होऊन गेलेली. म्हणून पूजेत त्यांना स्थान.
{{gap}}भाद्रपद अश्विनात पावसावर पोसली जाणारी पिके तरारतात. त्या काळात हादगा, बदकम्मा, भुलाबाई, सांझी, नवरात्र यासारखे समूहाने साजरे करायचे सण, व्रते येतात. जमिनीची उर्वराशक्ती वाढून धान्यलक्ष्मी घरी यावी, ती वाढावी म्हणून हे सामूहिक विधी. मार्गेसरी पासून वैषाखापर्यन्तचे सण सूर्याच्या पूजेचे. सूर्याला 'अपागर्भ' ...गर्भात पाण्याचा साठी असणारा म्हटले आहे. सूर्य प्रखरपणे तळपावा, भूमीची पाणी रिचवण्याची शक्ती वाढावी, ज्यामुळे तिची सर्जन शक्ती वाढेल या शुभेच्छेने पौषातले रविवार, सक्रान्त, चैत्र पाडवा, गणगौर.. चैत्रगौर, अक्षय्य तृतीया यासारखे सण साजरे करण्याची लोकपरंपरा, तीही समूहाने. एकत्र येऊन गाणी गात.
<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / २९ }}</noinclude> fc9ygsnra8ojsg3md8p2ioeoacc1ac7 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४४ 104 71033 155837 2022-08-21T08:27:40Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}रविन्द्रनाथांचे बंधू अवनीन्द्रनाथ यांनी बंगाली स्त्री-व्रतांचा अभ्यास केला. त्यात ते नोंदवतात.
{{gap}}A Vrata is a just desire. We see it represented in the pictures, listen to its echo in the songs and rhymes, witness its reactions in the dramas and dances...
{{gap}}...यात्वात्मक सामर्थ्याने कामनापूर्ती करण्याचे माध्यम म्हणजे व्रत. यातील प्रार्थनांत ईश्वरीकृपेचा संबंध नसतो. व्रताचरण हे सामूहिक कर्म असते. व्रतांचे सामर्थ्य यात्वात्मक असते. 'धर्म' ही संकल्पना दृढ होऊन जनमानसात रूजण्यापूर्वीचे, जेव्हा स्त्रिया शेती.. अन्न.. वस्त्र निर्मितीचे उत्पादनाचे काम करीत, त्यांना समाजात मध्यवर्ती... संवादिनीचे स्थान होते तेव्हा पासून ही व्रते स्त्रियांनी भूमीच्या सुफलीकरणारसाठी निर्मिली. असे 'लोकायत' या ग्रंथाचे निर्माते देवीप्रसाद चटर्जी यांनी नमूद केले आहे.
{{gap}}राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेशातील निमाड इत्यादी भागातली गणगौर आणि महाराष्ट्र कर्नाटकातली चैत्र तृतीयेला बसवली जाणारी गौर. या दोनही स्त्री व्रतोत्सवातली सामूहिकता त्यातील विधी. गाणी, पाणी, माती, सप्तधान्याची पेरणी, उगवणाऱ्या अंकुरांची पूजा, स्त्रीला व भूमीला निसर्गाने दिलेले सृजनात्मकता यातील नेमके नाते? आणि अनुबंध कोणता?
{{gap}}ही मनात उगवणारी नवी चांदणी आणि मग शोध... पुढे जाण्याची नवी दिशा...
{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|३० / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> m18co9yqt3sv90tio8fftglytybcuti पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४५ 104 71034 155838 2022-08-21T08:36:21Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 45 |bSize = 389 |cWidth = 299 |cHeight = 207 |oTop = 33 |oLeft = 42 |Location = center |Description = }}  {{center|'''अंगणात माझ्या
भदव्याचा मोर
आभाळी विहरे
सावळा चकोर..'''}}{{gap}}घनघोर काळ्याभोर ढगाची गर्दी दक्षिणेकडून घोंगावत येई. आणि अचानक त्यांनी वाट पाहणाऱ्या माझ्या तनामनातून या ओळी उमटल्या. त्यालाही आता ४०/४२ वर्षे उलटून गेली आहेत. तरी ते अंगणं, हिरवे..निळे..सोनसळी पंख पसरून, नाचणारा मोर, सावळ्या मेघांनी गर्द झाकलेले आभाळ अगदी तस्सेच ताजे टवटवित आहे.
{{gap}}खानदेश उन्हात भाजणारा असला तरी अर्धा भाग सातपुड्याच्या डोंगरमाळा आणि तापी... तप्ती सारखी प्रसन्नपणे धावणारी नदी यांमुळे दुष्काळाचा फेरा सतत घिरट्या मारीत नसे. पण मराठवाड्यात, त्यातूनही बीड जिल्ह्यात आल्यावर जाणवले की दुष्काळ जणू बाहेरच्या ओसरीच्या कोपऱ्यात कायम टेकलेला असतो. त्यामुळे श्रावणभादव्याचे अप्रूप मनात अधिकच रूजले.
{{gap}}१९७० चा काळ. पोळा आला तरी पेरण्या नव्हत्या. पण गणराया नाचत आले नि त्यांच्या तालावर पोरंसोरंही नाचली. एक दिवस खरात भाऊ सकाळीच आले. चहा घेतांना काहीशा घुटमळत्या आवाजात खाली मान घालून म्हणाले. "ताई जरा पन्नास रुपये मिळतील. लक्ष्म्या उद्याच घरला येतील त्यांच्यापुरता तरी साजाबाजा करायला<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ३१}}</noinclude> o9b3qv081asngbjyxpweavdf3qpizyg पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४६ 104 71035 155839 2022-08-21T08:50:36Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>हवा. ताई लक्ष्म्यांचा सण बामण, माळी, कोष्टी.. समदे अगदी आमी मांग... चांभार सुद्धा साजरा करतो. मालकीणीने सारखा तगादा लावलाय. ताईला नौकरी हाये. त्या नक्की देतील पैशे.. तुमी हे असलं काईपन करीत न्हाई पण आमाला लक्ष्मीला सजिवलं न्हाईतर अपसकुन वाटतो. मन धास्तावतं."
{{gap}}...ते शब्द मनात कायमचे रूजले. भारतीय सण, उत्सव, विधी आणि त्यांतील स्त्री प्रधानता यांचा शोध घेतांना फारपूर्वी मनात उगवलेल्या ओळी पुन्हा उलगडू लागल्या. कोकणात भाद्रपद शुद्ध षष्ठीला गौरींना आवाहन केले जाते. तर देशांवर लक्ष्म्या घरी येतात. कोकणात गौरी नदीतल्या खड्यांच्या असतात. काहींच्यात तेरड्याच्या झाडांच्या. देशावरच्या लक्ष्म्या मात्र अनेक घरी मुखवट्यांच्या.. तांब्याच्या लोट्याच्या वगैरे असतात पण लक्ष्म्या घरी येतातच. आणि तो 'कुळाचार' म्हणून श्रद्धेने साजरा होतो. बाहेरगावी असलेले मुलगे, सुना घरी येतात.
{{gap}}भारतीय जीवन परंपरेने स्त्रीला सुपीकतेचे प्रतीक मानले आहे. जमीन आणि स्त्रीमधील जनन क्षमता मानवाला गूढ वाटली. स्त्रिया या क्षमतेमुळे समाजात सन्माननीय आणि स्थिर झाल्या. अन्नाचा शोध, कंदमुळे शोधणे, पालेभाजी शिजवणे... याचा त्यांनीच शोध लावला. आणि ती सुपीकतेचे प्रतीक बनली. या काळात घरातल्या लक्ष्म्या, सुना माहेरी जात नाहीत. कर्नाटक आणि महाराष्ट्रात विधीपूर्वक हा सण आचरतात. मराठी माणूस. परप्रान्तात असला तरी धान्याच्या राशी मांडून पूजा केली जातेच. या संदर्भात स्टारबक हा समाजशास्त्रज्ञ म्हणतो हा सन्मान स्त्रीला शेतीप्रधान अर्थव्यवस्था व समाजव्यवस्थेतून मिळाला आहे. बैलांचा नांगर वापरात येईपर्यन्त स्त्री समाजाच्या केन्द्रस्थानी होते. मुदगलानी ही स्वत: नांगर चालवणारी, शेती करणारी स्त्री होती. अगस्ती ऋषीची पत्नी लोपामुद्रा हिने आपल्या बुद्धिवान परंतु आळशी पतीच्या हातात फावडे देऊन शेतीकामाला स्वत:बरोबर घेतले.
{{gap}}लक्ष्म्या हा सण शेतीच्या समृद्धीसाठी असतो. सप्तमीला त्या बसवतात अष्टमीला जेवतात. नवमीला परततात. या उत्सवावर स्त्रियांनी रचलेल्या शेकडो ओव्या परंपरेने गायल्या जातात.{{center|'''लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
धन्याच्या घरी लक्ष्मी आली.'''}}{{gap}}सोन्याची पावले ज्येष्ठेची की कनिष्ठेची? ज्येष्ठा कोण? अमृतप्राप्तीसाठी समुद्रमंथन केले तेव्हा लक्ष्मीच्या आधी अलक्ष्मी, साक्षात् दारिद्रय... अशुभ...<noinclude>{{rh|३२ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 2yi4756nxc9k0kdt5uzbacpdtp2qar9 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४७ 104 71036 155840 2022-08-21T09:12:04Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>अनिष्टदायिनी बाहेर आली. नंतर लक्ष्मी. तिच्यावर नारायणराव भाळले. पण मोठीच्या आधी धाकटीचा विवाह कसा होणार? मग अलक्ष्मीचा विवाह उद्दालक मुनींशी लावला. तर तिथे आश्रमातले सात्विक वातावरण तिला सोसेना. तिने तिच्या अनिष्ट आवडी निवडी सांगितल्या. मुनी अस्वस्थ झाले. तिला एका अश्वत्थ वृक्षाखाली बसवून ते परतले. ज्येष्ठा अलक्ष्मी पतीची वाटच पहात राहिली. शेवटी आक्रोश करू लागली. तो ऐकून लक्ष्मीनारायण तिथे आले. त्यांनी तिला सांगितले तू इथेच स्थिर हो. दर शनिवारी लक्ष्मी तुला भेटायला येईल. हा वृक्ष पूज्य मानला जाईल. दूर्जनं प्रथमं वन्दे' ही मानवी प्रवृत्ती आहे. दैवत शास्त्रांचे मान्यवर अभ्यासक रा. चिं. ढेरे लिहितात, श्री सूक्तानुसार लक्ष्मी हस्तिनाद प्रबोधिनी, गजलक्ष्मीच्या रूपात आहे. गज हे पुरूषत्वाचे प्रतीक. पाऊस पाडणाऱ्या आभाळाचे प्रतीक, या काळात ज्येष्ठ आषाढात पेरलेली पिके भरात येतात. कणसात येतात. सृष्टीच्या सुफळसंपूर्णतेचे हे दिवस. गौरी बोळवतांना कोकणातली स्त्री विचारते.
'''आज गौरी जाशील ती कधी गौरी येशील?
पाऊस पडे, गंगा भरे येईन मी भादव्यात
पडवळीच्या फुलांवरनं येईन मी तळपत
पाच पडवळं काढा माझ्या हौशा करवी...'''
{{gap}}देशावरची स्त्री म्हणते,
'''सरिला सरावन भादवा आनंदाचा
आशा पाठमोरी मुऱ्हाळी सुखाचा
पाऊस पडला चिकूल झाला
वहात आली गंगा...
पेरिला मका, धान्य लाल तुरी
पावनीला वाढा भाजी ठेचा आणि भाकरी...'''
{{gap}}या पाहुणीला आल्या दिवशी रानातली हिरवी भाजी, ठेचा आणि ज्वारीची भाकरी करतात. दुसऱ्या दिवशी खास जेवण. १६ भाज्या, १६ चटण्या, १६ पक्वान्ने. जणू हा समृद्धीचा, कृषिलक्ष्मीचा सत्कार. अन्न देणारी अन्नदा म्हणून भरपूर पदार्थ करतात. दिवे सुद्धा ज्वारीची... मुख्य धान्याची उकड काढून करतात.
{{gap}}अलक्ष्मीचे शोभन नाव शुभा आहे. 'शुभा' चा अर्थ शेण असा आहे. शेण... विशेषत: गायीचे शेण जंतुनाशक असते. भारतीय जीवनात मडके, सूप, शेणाचे सारवण, शेणाची गोवरी यांना विशेष महत्व आहे. गोवरीच्या धुराने घर शुद्ध होते.
<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ३३ }}</noinclude> m3m0ldr6olv9g983gm7udq0eo2g3xo5 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४८ 104 71037 155841 2022-08-21T09:14:28Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}रा. चिं. ढेरे यांच्या मते ज्येष्ठा अलक्ष्मी आणि कनिष्ठा लक्ष्मी एकाच देवी संकल्पनेची द्वंवात्मक रूपे आहेत. त्यातून दैवत कल्पनांचा विकासक्रम जाणवतो. लक्ष्मीच्या पावलांच्या रेखाकृती प्रत्येक खोलीत, गाईच्या गोठ्यात फिरतात. ही रेखाकृती धान्याचे भरलेले मापटे, दिवा यांचे संकेत देणारी असते.
{{gap}}पाणी असेल तरच जमिनीची उर्वराशक्ती सुफलित होणार म्हणून सर्वसाधारणपणे गौर पाण्याजवळ नदी वा तळ्यावर नेऊन विसर्जित करतात. मराठवाडा निजामाच्या सुलतानी सत्तेखाली होता. त्यामुळे असेल कदाचित् पण आपल्याकडे गौरीचे मुखवटे सन्मानाने उतरवून तुळशीपर्यन्त नेतात. निजामाच्या अमलाखाली असलेल्या मराठवाड्यात स्त्रिया रस्त्यावर फिरू शकत नव्हत्या. या दिवशी घरातील स्त्रियांना, सुनांना सन्मानाने प्रथम जेवायला बसवतात. आमच्या आदीम परंपरांनी स्त्री पुरूष यांच्या समान, परस्पर पूरक अस्तित्वाचा सत्कार केला होता. तिला दुय्यम मानले नव्हते.
{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|३४ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 6x69to8c4lao2cdj6zk6j126xnp5g6r पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/४९ 104 71038 155842 2022-08-21T09:21:20Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 49 |bSize = 389 |cWidth = 320 |cHeight = 209 |oTop = 39 |oLeft = 30 |Location = center |Description = }}  {{gap}}दक्षिण आफ्रिकेजवळच्या मादागास्कार बेटांतून मान्सून वारे हिंदी महासागरावर हिंदोळत गिरक्या घेत. तरंगत थेट केरळात येतात. ज्येष्ठाचं बोट धरून उत्तरेची वाट धरतात. पहिल्या पावसाच्या स्पर्शाने वृद्ध वडाच्या अंगावरही तृप्तीचे शहारे लहरतात. कर्नाटकात जेष्ठी पोर्णिमेला पेरणीचा मुहूर्त करतात. झाडांची पूजा म्हणजे वर्षाऋतूचे स्वागतच. ज्येष्ठी पोर्णिमेस वडाची पूजा केली जाते. त्यात पती सहवासाची शुभकामना असते.
{{gap}}ज्येष्ठा पाठोपाठ आषाढ आभाळात दाटून येतो. घनगर्द सावळे मेघ ओथंबून येतात. आणि ओठावर कालिदास तरळू लागतो.{{center|'''आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाषलिष्ट सानुः
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श'''}}{{gap}}डोंगर शिखराला ढुशा देण्यासाठी वाकलेल्या उत्तर दिशेने जाणाऱ्या मेघराजा बरोबर, हिमालयातील कैलास पर्वतावरील अलकानगरीत रहाणाऱ्या आपल्या प्रिय पत्नीस... सखीस रामगिरीवरच्या यक्षाने आपल्या विरहार्त मनाचा संदेश... निरोप पाठवला. ते काव्य म्हणजे कवी कालिदासाचे काव्य 'मेघदूत'. आता हा यक्ष नागपूरजवळच्या रामगिरी पर्वतावर का रहात होता?{{center|'''जे न देखे रवी ते देखे कवी...'''}}<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ३५ }}</noinclude> rhi2naqxf09jv2qlmf6n238gladrh1k पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५० 104 71039 155843 2022-08-21T09:29:28Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{gap}}कवी कल्पनेच्या क्षितीजावर सतत नवनवे अंकुर फुटत असतात. कालिदास हा 'कवि कुलगुरू'. श्रेष्ठ भारतीय कवींची मोजदाद करावी म्हणून कालिदासाच्या नावाने करंगळी मोजली. आता दुसरे नाव? त्याच्या इतक्या योग्यतेचा दुसऱ्या कवीचे नाव सुचेना आणि करंगळीच्या शेजारच्या बोटाचे नाव पडले अनामिका.{{center|'''अनामिका सार्थवती बभूव'''}}{{gap}}अनामिका हे नाव सार्थच ठरले.
कालिदास हा नाटककार होता. 'शाकुन्तलम्' या नाटकाचा अनेक परदेशी भाषात अनुवाद झाला. कालिदासाच्या जन्ममृत्यू बद्दल अनेक लोककथा प्रसिद्ध आहेत. त्यातली एक अशी. कालिदास जन्मला ब्राह्मण कुटुंबात. परंतु लहानपणी आईवडिल मरण पावल्याने एका गवळ्याने त्याला वाढवले. तो देखणा, सुदृढ व बुद्धिमान होता. मात्र गुरुकुलात शिक्षण घेऊ शकला नाही. शेजारच्या राज्याच्या राजकन्येचा विवाह तेथील कपटी प्रधानाने या देखण्या मुलाशी लावला. आपला पती विद्या विभूषित नाही हे लक्षात येताच तिने त्याला हाकलून दिले. नंतर त्याने कालीमातेची उपासना केली वगैरे वगैरे... असला दैवी जोड देऊन कथा पूर्ण करण्यात आपली ख्याती आहेच. त्याने एखाद्या गुरूकुलात जाऊन विद्या ग्रहण केली असावी. असे म्हणूया. नंतर तो राजकन्येकडे आला. तिने त्याला प्रश्न केला "अस्तिकश्चिद् वाग्विशषः? तुझ्या वाणीत काही विशेष गुण आले का?
{{gap}}कालिदासाने या प्रश्नातील प्रत्येक शब्दांपासून सुरुवात होणारे तीन काव्यग्रंथ निर्माण केले. 'अस्त्युत्तरस्यां दिशी देवात्मा' ही शिवपार्वतीपुत्र कार्तिकेयाच्या जन्माची कथा आहे. ही कुमारसंभवम् या काव्याची सुरूवात आहे. 'कश्चित्कान्ता विरह गुरूणा' ही मेघदूत या जगद्विख्यात रचनेची सुरूवात. तर, 'वागर्थाविवसंपृक्तौ' ही रघुवंश या काव्याची सुरुवात.
{{gap}}कालिदास हा गुप्त घराण्यातील दुसरा चन्द्रगुप्त विक्रमादित्य याच्या दरबारात राजकवी होता. त्याचे वास्तव्य उज्जैनीत होते असे मानले जाते. त्याला हिमालयाचे विशेष आकर्षण होते.
{{gap}}...मेघदूत हे कवि प्रतिभेतून साकारलेले काव्य. त्याला पुराण वा देवकथेचा आधार नाही. त्याचे कथानक असे... एका यक्षाकडे ड्यूटी होती इन्द्रदेवाच्या पूजेसाठी १०८ कमळे आणून त्यातील भुंगे काढून टाकण्याची. हे काम करतांना यक्षाला सतत आठवण येत होती पत्नीशी केलेल्या शृंगार क्रीडांची. त्या व्यवधानात एका कमल कलिकेतला भुंगा आत तसाच राहिला. तो देवन्द्र इन्द्राला चावला. मग अर्थातच शाप.<noinclude>{{rh|३६ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> tv6cuddp7d15jlgoc8dcjkteel58kmc पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५१ 104 71040 155844 2022-08-21T09:33:10Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>'तू जिचा विचार करीत होतास तिचा आणि तुझा एक वर्ष विरह होईल,' लगेच यक्षाची पाठवणी नागपूर जवळच्या रामगिरी पर्वतावर झाली. आषाढाच्या पहिल्या दिवशी काळ्याभोर मेघरूपी बलदंड हत्तींचे थवे उत्तरेकडे जातांना पाहून यक्षाने त्या मेघांनाच दूत करून आपल्या पत्नीला आपली हृदय व्यथा व निरोप कळविला. तिचे निवासस्थान हिमालयातील कैलास शिखरावरील अलकानगरीत होते. तिथे जाण्याचा भौगोलिक मार्गही त्याने मेघाला सांगितला.
{{gap}}काश्मिर, ओरिसा, बंगाल, मध्यप्रदेश येथील लोक त्याला आपला रहिवासी मानतात. पण तो भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा भारतीय महाकवी होता आणि आहे. त्याला हिमालयाचे, तेथील निसर्गाचे आकर्षण होते. कुमारसंभव, मेघदूत या काव्यात हिमालयाचे देखणे वर्णन त्याने केले आहे. 'उपमा' हे तर त्याचे वैशिष्ट्य राजकवी म्हणून निवड करण्यापूर्वी राजाने त्याला प्रश्न विचारला {{center|'''कमले कमलोत्पत्ती श्रूयते न तु दृष्यते'''}}{{gap}}(कमलावर दुसरी दोन कमळे आहेत असे म्हणतात, पण ती दिसत नाहीत. तर कशी?)
{{gap}}या श्लोकाची परिपूर्ती करतांना त्याने उत्तर दिले,{{center|''' 'बाले तव मुखाम्भोजात् कथमिन्द्रीवरद्वयम्'''}}{{gap}}बाले तुझ्या मुखकमलावर तुझे दोन निळे निरागस डोळे, ती जणु दोन कमळेच!
{{gap}}असा हा कवी कुलगुरू. प्रत्येक भारतीयाने याच्या काव्याबद्दल, नाटकांबद्दल, त्याच्याबद्दल वाचले पाहिजे. तरच आपले 'भारतीयत्व' चहुअंगांनी बहरून जाईल. संपृक्त होईल.
{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ३७ }}</noinclude> davsgwivh1mx3tnt8d734x6wjws7qn4