विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.39.0-wmf.25 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/68 104 63338 155883 108233 2022-08-22T17:03:35Z अरुणा केळकर. 3805 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अरुणा केळकर." />४० {{center|{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}}}</noinclude>हजारों स्त्रीपुरुषांची गर्दी उडून राहिली होती. हिंदुस्थानांतील कृष्ण व बुद्ध यांची पूजा करणाऱ्या स्वामींचें शिकागो येथे भरलेल्या सर्व-धर्माच्या परिषदेंत वेदांतावर व्याख्यान झाले होते व त्यावेळी एकंदर व्याख्यानांमध्ये यांचे व्याख्यान सर्वांस फार आवडले होते. केवळ धर्मासाठी यांनी आपल्या सर्व उच्चतम आशा बाजूस ठेविल्या आणि कित्येक वर्षे निरलसपणे त्यांनी पुरातन तत्वज्ञानाचा अभ्यास केला. पाश्चात्य शास्त्रांचाहि त्यांनी चांगला अभ्यास केला आहे. पाश्चात्य शास्त्रे आणि जुनी वेदांततत्वे यांचे अपूर्वसंमेलन त्यांच्या ठिकाणी झालें आहे. त्यांची संस्कृति, विद्वत्ता, वक्तृत्व, शुद्धाचरण आणि पावित्र्य यांची कीर्ति अगोदरच पसरली असल्यामुळे आपणास आज कांहीं तरी अलभ्य लाभ होणार आहे असे वाटून सर्व श्रोते भाषणश्रवणासाठी अगदी उत्कंठित होऊन राहिले होते. त्यांची उत्कंठा विफल झाली नाही.
स्वामींची कीर्ति आपण ऐकिली ती प्रत्यक्षापुढे कांहींच नाही असेंच सर्वांचें मत झाले. काषायवस्त्र परिधान केलेले हे स्वामी श्रोत्यांपुढे उभे राहिले तेव्हां त्यांच्या अंतर्गत तत्वविचारांचे अपूर्व तेज त्यांच्या मुखमंडळावर झळकत होतें. प्रेम, सहानुभूति आणि सहिष्णुता ही मूर्तिमंत त्यांच्या मुखावर व्यक्त होत होती. इंग्रजी भाषेवरील त्यांचे प्रभुत्वहि वाखाणण्यासारखे आहे. बुद्धाचें तत्वज्ञान आणि ख्रिस्ताची नीतितत्वे यांचा अपूर्व संयोग ज्यांत झाला आहे असा नवा धर्म शिकविण्याकरितां स्वामी महाराज येथे आले आहेत. हिमालयांतील साधु कसे असतात याची कल्पना स्वामींच्या दर्शनाने आम्हांस झाली.
स्वामींच्या व्याख्यानासंबंधी कोणी कांही म्हटले तरी एकंदरीने त्यांचे व्याख्यान अत्यंत चित्ताकर्षक होतें यांत तिलमात्र संशय नाही. डाक्टर लुई जेम्स यांनी स्वामींची श्रोत्यांस ओळख करून दिल्यानंतर स्वामी श्रोत्यांचे मनःपूर्वक आभार मानून ह्मणाले :
"जगांत उपलब्ध असलेल्या सर्व धर्माचा अभ्यास करणे हाच माझा धर्म होय. ख्रिस्ती धर्मपुस्तकांचा मी चांगला अभ्यास केला तेव्हां मला माझ्या मातृधर्माचें चांगले ज्ञान झाले. मला जी काही तत्वें पूर्वी गूढ वाटत होती त्यांची नीट संगति लागली. सत्य हे सर्वत्र एकच आहे. ज्याप्रमाणे एखादा सहा बोटांचा मनुष्य हा सामान्य मानवी देहाचा नमुना नसून त्यास सृष्टिबाह्य असे आपण ह्मणतों तशीच धर्माचीहि गोष्ट आहे. कोणताहि एक धर्म खरा म्हटला की, बाकीचे सर्व खरे असलेच पाहिजेत. जगांतील सर्वच धर्म खरे असल्यामुळे<noinclude></noinclude> axf74h4eb2vc69t0byq7nhl0xldew73 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/69 104 63339 155884 108234 2022-08-22T17:12:00Z अरुणा केळकर. 3805 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अरुणा केळकर." />{{center|{{x-larger|प्रथम खंड.}}}} {{right|४१}}</noinclude> माझा धर्म अमुक आणि तुमचा धर्म अमुक असा भेद करणेहि योग्य नाही. हिंदुधर्मावर जितका माझा तितकाच तुमचाहि हक्क आहे. हिंदुस्थानच्या वस्तीत वीस लक्ष ख्रिस्ती, सहा कोटी मुसलमान आणि बाकी सर्व हिंदु आहेत.
हिंदूंचा धर्म वेदप्रणित आहे. जगांतील सर्व धर्माचे सार, आमच्या मतांप्रमाणे वेदांतर्गत आहे. तथापि सर्व सत्य केवळ वेदांतच आहे असे आमचे ह्मणणे नाही. 'आत्मा अमर आहे' असें वेदांनी आमांस सांगितले आहे. कोणत्याही काली आणि कोणत्याही स्थली मनुष्यमात्राची सर्व खटपट कोठे तरी स्थिर जागा शोधण्यासाठीच चाललेली असते. केव्हांहि नष्ट न होणारी अशी सुखभूमि सांपडावी हाच त्याच्या धडपडीचा हेतु असतो. एकंदर सृष्टीचे अवलोकन केले तर दृश्य सृष्टीत अशी जागा सांपडेल असा भरंवसा आपणांस वाटत नाही. प्रत्येक क्षणीं बदलत असणाऱ्या या दृश्य जगांत स्थिर जागा सांपडणार कशी?
परंतु यावरून अशी जागा कोठेच नाही असे कोणी ह्मणेल तर तो मात्र त्याचा भ्रम आहे. अशा भ्रमाचे पर्यवसान नेहमी चार्वाकवादांत होतें. 'भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः' असें ह्मणून 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ' असा चार्वाकाने आपल्या अनुयायांस उपदेश केला आहे. त्याच्या मताप्रमाणे आत्मा, धर्म, मन इत्यादिकांचे अस्तित्व वंध्यापुत्राच्या कथेसारखें आहे. पंचज्ञानेंद्रियांनी आत्मा वस्तुतः बद्ध नाही असें वेदांताचे मत आहे. या इंद्रियांच्या द्वारें वर्तमान अथवा चालू कालाचे ज्ञान होते, ही गोष्ट आपल्या नित्य अनुभवाची आहे. तसेच त्यांच्या द्वारें भूत व भविष्यकालाचे ज्ञान होत नाही, ही गोष्टहि अनुभवसिद्ध आहे. कालाच्या एकतानतेंत हा भेद वास्तविक नसून तो केवळ इंद्रियजन्य आहे. जर भूत, वर्तमान आणि भविष्य हे काल वास्तविक अलग असते—यांतील भेद खरा असता-आणि भूतकालाचे ज्ञान वर्तमानांत आणण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नसते तर आपणास वर्तमानाचें ज्ञानहि झाले नसते. यावरून या त्रिकालास जोडणारे इंद्रियातीत असें कांहीं तरी स्वतंत्र साधन असले पाहिजे, हे उघड होते.
परंतु स्वतंत्र साधन ह्मणजे काय याचा विचार येथे करणे अवश्य आहे.आपले शरीर पाहिले तर भोवतालच्या परिस्थितीची गुलामगिरी त्याने पूर्णपणे पत्करलेली दिसते. मन स्वतंत्र ह्मणावें तर तें विचारांचे बांधलेले आणि विचारांची उत्पत्ति बाह्यसृष्टीवर अवलंबून असणार ! तेव्हां असें स्वतंत्र साधन<noinclude></noinclude> 57jwi42uoimayxyy2az41lveh01ss26 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/70 104 63340 155885 108235 2022-08-22T17:18:38Z अरुणा केळकर. 3805 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अरुणा केळकर." />४२{{center|{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}}}</noinclude> शरीर आणि मन यांहूनहि निराळे असले पाहिजे असे उघड दिसतें. तें साधन आत्मा हे होय. स्वातंत्र्य आणि अत्यंत पारतंत्र्य यांच्या मिश्रणाने हे जग बनले असून अत्यंत स्वतंत्र, पूर्ण आणि पवित्र असा परमात्मा सर्व विश्वाच्या द्वारें व्यक्त झाला आहे असें वेदांनी सांगितले आहे. त्याला मृत्यु नाही, कारण मृत्यु ह्मणजे नष्ट होणे नसून एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणे होय. तो अत्यंत पूर्ण असल्यामुळे स्वतंत्र आहे. अपूर्णता असणे ही एक विशिष्ट परिस्थिति आहे; आणि आत्मा परिस्थितीने मर्यादित नसतो. हाच पूर्ण आणि स्वतंत्र परमात्मा थेट ईश्वरापासून तों अगदी हलक्या भिकाऱ्यापर्यंत सर्वांत एकसारखाच आहे, यांत जो फरक दिसतो त्याचे कारण तो परमात्मा व्यक्त होण्याच्या साधनांत असणारा फरक हे होय.
परंतु आत्म्याने शरीर का धारण करावे, असा प्रश्न निघतो. त्याचे कारण असें, की माझें मुख पाहावयास जसा मी आरसा घेतों, तद्वत् स्वतःचे प्रतिबिंब परमात्म्यास शरीरधारी जीवात्म्यांत दिसते. जीवात्मा हा परमात्म्याचे प्रतिबिंब आहे आणि केव्हांना केव्हां तरी जीवात्मा आपल्या मूळच्या स्वरूपास प्राप्त होईलच होईल. मी एखाद्या अंधाऱ्या जागेत जाऊन कितीहि कोरडी ओरडाओरड केली तरी प्रकाशाची प्राप्ति मला होणार नाही. त्यासाठी एक काडी पेटविली की अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेंच 'मी पापी, मी पापी' ह्मणून आपण कितीहि रडलों तरी त्याचा उपयोग काय? त्यामुळे आपण आपल्या अपूर्णस्थितीतून निघून पूर्णत्वास जाऊं असा यत्किंचितहि संभव नाही. याकरितां आपलें मूळस्वरूप काय हे ओळखून त्याचे तेज फांकेल असा यत्न करा असें वेद अनादिकालापासून सांगत आहेत. आतां यापुढे 'मी पापी' अशी प्रार्थना करण्यास मुलांस शिकवू नका. धर्म ही कांहीं तरी मूर्खपणाची कवाईत नाही. परमेश्वरप्राप्तीचा तो निश्चित मार्ग आहे, ही गोष्ट त्यांच्या मनावर ठसवा. एखादें दुःख प्राप्त झाले ह्मणजे 'अरे परमेश्वरा' ह्मणणे, हा धर्म नव्हे. आपले संपूर्ण तेज फांकेल अशा रीतीने प्रत्येक कार्यात आपली वर्तणूक ठेवणे, हा धर्म आहे.
प्रत्येक मनुष्याचा वर्तमान आणि भविष्य आयुःक्रम पूर्वक्रियेवर अवलंबून असन चालू जीवित हे पूर्व क्रियेचें फळ आहे; याबद्दल सर्व धर्माचे एकमत आहे. एक मूल चांगल्या आईबापांच्या पोटी जन्मास येऊन चांगले शिक्षण मिळविते आणि श्रीमान् होते. दुसरे मूल भिकाऱ्याच्या पोटी येऊन जन्मभर भिकारी राहते. न्यायी परमेश्वरावर या विसदृशतेचे खापर फोडणें अनुचित<noinclude></noinclude> o2wz25cdex9gt53lpkp3mos5kq29dnu पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७२ 104 71076 155886 2022-08-23T07:45:38Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 72 |bSize = 386 |cWidth = 323 |cHeight = 209 |oTop = 39 |oLeft = 33 |Location = center |Description = }} {{gap}}'प्रेम' म्हणजे नेमके काय? या विचारावर गेली हजारो, शेकडोवर्षे कवींनी कथा, कविता, नाटके लिहिली. आपापले विचार... मते मांडली. तरीही ते कधीच शिळे झालेले नाही. प्रेमात पडायला वय, धर्म, जात काहीही आडवे येत नाही. प्रेम सततच्या सहवासामुळे निर्माण होते की 'प्रथम तुज पाहता जीव वेडावला' या प्रकारचे असते? ती ओढ दोन मनांच्यात असते की तनांच्यात? ती दोन भिन्नलिंगी जीवांची संवेदनशील बांधिलकी असते असे आजवर ठामपणे सांगितले जाई. पण गेल्या पंचवीस वर्षात समलिंगी आकर्षणालाही समाज सामावून घेऊ लागला आहे. १९८७ मध्ये तेव्हाच्या पश्चिम जर्मनीत मौलोफला आंतरराष्ट्रीय महिला परिषदेस जाण्याची संधी मिळाली. परिषदेनंतर दोन दिवस ब्रेमनला तिथल्या महिला विभागाची कार्यकर्ता ख्रिस्ता डुरकडे रहाण्याचा योग आला. तिथे 'लेस्बियन' या शब्दाची ओळख झाली. जर्मनीतील शेतकरीण, आठवडे बाजार, संकटग्रस्त स्त्रियांचे दिलासाघर यांना भेट द्यायचे ठरले होते. खिस्टा आणि ऊलाने एका कॉफी हाऊसमध्ये नेले. आणि सांगितले ते एका समलिंगी जोडप्याने सुरू केले आहे. तिथे अशी जोडपी दिसतील. 'डोन्ट गेट ऐक्साइटेड' असेही बजावून सांगितले. एका वेगळ्या प्रेमाची ओळख झाली. अशा व्यक्तींना लेस्बियन म्हणतात.
{{gap}}मुळात प्रश्न पडतो प्रेम दोन जीवांचे, मनांचे की त्या जीवांनी धारण केलेल्या देहांचे. म्हणूनच प्रेमाच्या आड धर्म, जात येत नाही. पण परंपरेने देहाला मात्र धर्म दिला<noinclude>{{rh|५८ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> r6gv3j2cbdcrbkyiud6zvikaxda8en0 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७३ 104 71077 155887 2022-08-23T08:02:58Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>आहे आणि जातही चिटकवली आहे. आणि मग समस्या... अडचणी सुरू होतात. मंग तो दोन जीवांच्या... मनांच्या बांधिलकीचा मुद्दा रहात नाही! कुठे नि कुणाच्या घरी... पोटी जन्माला यायचे ते जन्मणाऱ्या व्यक्तीच्या हाती कुठे असते? त्यांत जीव... मन हे पिकातलं ढोर. {{center|'''किती हाकला हाकला
फिरी येतं पिकावर...'''}}{{gap}}दोन मनाजीवांची ओढ धर्म, जातीला गिमत ...मोजत नाही. मग वर्तमानपत्रांतून बातम्या... 'आंतरजातीय विवाहीत जोडप्याला जाळून टाकले.' 'भिन्न धर्मीय प्रेमी युगुलाची आत्महत्या' वगैरे वगैरे.
{{gap}}परदेशात तर सत्तरीचा 'तरूण' तिशी पंचविशीच्या पोरीच्या प्रेमात पडून विवाह करतो. आपल्याकडे असे पूर्वी होई. तो 'प्रेमात' पडून नसे तर जबरदस्तीने केलेला जरठकुमारी विवाह असे. अलिकडे मात्र असे क्वचित् होते. पण त्यामागे बापाची लालसा असते. प्रितीची फलश्रुती विवाहात होण्याचा संकेत आहे. पुढच्या पिढीला ... त्यांच्या पोटी जन्मणाऱ्या लेकरांना समाजमान्यता मिळणाच्या दृष्टीने ते सोयीचे असते. हा संकेत काहीजण पाळत नाहीत. विवाहाचा उपचार बाजूला ठेवून बांधिलकी मानून एकत्र राहतात.
{{gap}}मग पुन्हा प्रश्न. प्रेमात देहाची एकरूपता हवीच का? त्याशिवाय प्रेमाला परिपूर्णता येतच नाही का? अशारितीने प्रेम हे अधिक सकस ...श्रेष्ठ म्हणायचे का?
{{gap}}मध्यंतरी अगदी जवळचे स्नेही घरी आले. त्यांना कन्येने परधर्मीय मुलाशी लग्न ठरवले. ते दोघे उच्चशिक्षित. दोघांच्या व्यावसायिक पदव्या पूरक. एक ॲनेस्थेटिक मधली उच्च पदवी धारक तर दुसरी व्यक्ती निष्णात शल्य चिकित्सक. लेकीने सांगितले मी लग्न याच्याशीच करणार. तुमचे आशिर्वादही हवेत. ते मिळणार नसतील तर विवाहाचा उपचार करणार नाही. पण बांधिलकी रहाणारच. मायबाप दोघही उच्चशिक्षित. वडिलांची भूमिका, धर्म कोणीच बदलू नये. आणि ही कोंडी भारतीय संविधानाचे रचनाकार ज्ञानतपस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सोडवली आहे. नोंदणीकृत विवाहात जात धर्म काहीच आडवे येत नाही.
{{gap}}प्रेम हे दोन जीवांचे... मनांचे असते, ते डोळ्यातून वाचता येते. बांधिलकी या शब्दातच दृढता असते. माया, ममता, करूणा या शब्दांतून वात्सल्य प्रतीत होते. प्रेम त्या वेगळे असते. प्रेमात 'दर्द' ... 'आर्तता' असते. ज्ञानदेवांनाही विठ्ठलाच्या सायुज्यतेची ओढ विराणीतून व्यक्त करावी लागली.
<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ५९ }}</noinclude> hgcr9xcfoi3vhrjv2nu8h3wo5fg1rej पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७४ 104 71078 155888 2022-08-23T08:08:13Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{center|'''दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले
बाप रखुमादेवीवरे मज ऐसे केले'''}}{{gap}}श्रीकृष्णा बद्दलची एक कथा सांगितली जाते. विवाहानंतर सत्यभामा रूक्मिीणीला वाटते एकदा बघावे तरी त्या राधेला. तिचेच नाव श्रीकृष्णाशी अजूनही का जोडले जाते? राधेला त्या सन्मानाने बोलावतात. सन्मानपूर्वक वागवतात. निघतांना तिचे पाय धुवून, त्यावर चंदन कुंकुम रेखून, वस्त्र देऊन पाठवायचे. दासीला पाणी आणायला सांगतात. पाणी इतके गरम की पाय बुडवताच पाय पोळतात. पायाला फोड येतात. राधा आनंदाने तृप्त होऊन गोकुळात परतते.
{{gap}}...रात्री श्रीकृष्ण घरी येतो. सत्यभामेच्या महालात प्रवेश करतो ते लंगडत. भामा पाय चेपायला जाते तर तळपायावर मोठे फोड आलेले...
{{gap}}सायुज्यत्व सर्वात्मक आणि शब्दांत न मावणारे असते.
{{Right|{{xx-larger|□}}}}<noinclude>{{rh|६० / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> 84o3f47qocp7ntpldbtv2b7oosbzxiz पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७५ 104 71079 155889 2022-08-23T08:20:10Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>{{Css image crop |Image = रुणझुणत्या_पाखरा.pdf |Page = 75 |bSize = 386 |cWidth = 312 |cHeight = 209 |oTop = 35 |oLeft = 29 |Location = center |Description = }}  {{gap}}"शरे, वादविवाद स्पर्धेत एकत्र कुटुंब पद्धतीच कशी श्रेष्ठ आहे. वृद्ध आणि लहान मुलांना सुरक्षितता दिलासा देणारी आहे हे विविध दाखले देऊन पटवून देणारी तू. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत सतत जिंकणारी तू. आणि आता. अरूण सत्तरीला टेकलाय. तू पासष्टी पार केलीस. आपल्या काळात 'हम दो हमारे दा' चा नारा नव्हता, त्रिकोणाची रित होती. तू तर दोन मुलानंतरच पूर्ण विरामाची इच्छा व्यक्त केलीस अरूणने मात्र लेकीशिवाय पूर्णत्व नाही हा हट्ट धरला. तो पूर्ण झाला. तुझी धाकटी नीरासुद्धा पस्तिशीची आहे. शैलेश, नवीन गावातच रहातात. पण तरीही तू नि अरूण एवढ्या मोठ्या घरात दोघेच का रहाता?"
{{gap}}नीलाने आपल्या मनातली खळखळ शरयुजवळ भडाभडा मोकळी केली. शरयूला ही गोष्ट तशी नवी नव्हती. तिच्या आणि अरूणच्या अनेक मित्र मैत्रिणींना हा प्रश्न सलत असे.
{{gap}}"नीले, चार दिवसांपूर्वी तुझा फोन आला. की तुझ्या मनात खूप... खूप साठलंय. ते मोकळं करायला आलीस ना? मग आधी तू बोलती हो. तुला आवडणारी हळद मिठाची मऊ खिचडी कुकरमध्ये लावते. मधला नवीन माडीवर रहातो. तिला बाजरीच्या तीन भाकरी, वरून तीळ लावलेल्या... आणि वांग्याचं भरित आणायला सांगितलंय, शैलेशचा दवाखाना जवळच आहे. त्याने गेल्यावर्षी घर बांधलय त्याची पत्नी अनिता फिजिओथेरपिस्ट आहे. तिने कालच लोणचं पाठवलंय. आणि ती<noinclude>{{rh|||रुणझुणत्या पाखरा / ६१ }}</noinclude> gi9t7iyboex8g2jdc5egw4vsyr3aj09 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७६ 104 71080 155890 2022-08-23T08:27:17Z अश्विनीलेले 3813 /* मुद्रितशोधन */ proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="अश्विनीलेले" /></noinclude>फ्रुटसॅलड पाठवणारेय. आज आपणं गप्पा मारत जेवू. उद्या माझी स्वयंपाक करणारी आशा येईल. त्या सगळ्यांना उद्या इथेच जेवायला बोलावलय. आणि नीरा, रमाकान्तही येतील. नीरा सिडकोतल्या गृहविज्ञान महाविद्यालयात शिकवते. तर चल व्हरांड्यात बसू. मस्त गप्पा मारत. बराच ताण देऊन तो बाबाही... पाऊस चार दिवसांपासून रोज हजेरी लावतोय. जाई आकंठ झुंबरलीय. तिचा मंद मधुर सुवास घेत गप्पा नक्कीच रंगतील."
{{gap}}शरयू नि नीला पाच सहा वर्षानंतर भेटत होत्या. नीलाने लातूर सारख्या तेव्हाच्या छोट्या गावात मांड मांडलाय. आता मात्र ते वाकडं तिकडं वाढतंय. अर्थात सगळीच शहर वाकडी तिकडी ऑक्टोपस सारखी वाढत असतात. नीला मोहनने ऐसपैस मोठं घर बांधलय. तीनही मुलांना तीन मोठ्या खोल्या. त्या खोल्यात, त्यांच्या मुलांना लागेल म्हणून अजून एक खोली. प्रत्येकीत अत्याधुनिक संडास, न्हाणीघर वगैरे. मुलांच्या खोल्या मजल्यावर. आणि नीला मोहनची खोली, अभ्यासाची खोली, स्वयंपाक घर वगैरे तळमजल्यावर. कसं छान, आदर्श. पण तरीही मनात काय साचलयं...?
{{gap}}"शरे, आपण दोघींनीही एकत्र कुटुंबाचा आग्रह धरला. मी नि मोहनने त्या दृष्टीकोनातून तीस वर्षापूर्वी घर बांधलं. तिघी सुना शिकलेल्या आहेत. धाकटी बारावी झालेली. सचिनचा प्रेमविवाह. ती चांभार समाजातली आहे. देखणी आहे. सुस्वभावी आहे. मधल्या सौरभची पत्नी अस्मिता संस्कृतची अध्यापक. गावातल्या महाविद्यालयात नोकरी करते. ती दशग्रंथी ब्राह्मण घरातून आमच्या सारख्या मराठीने केला गुजराथी भ्रतार अशा घरात आलीय. माझ्या घरात देव नाही. निसर्ग हाच ईश्वर, मानणारी मी. पण तिने हौशीने देवघर मांडले. त्यात देवी. लंगडा बाळकृष्ण यांच्या मूर्ती ठेवल्या. मी विरोध अर्थातच कशाला करू. ती तिची इच्छा. ती घरातली सदस्या. पण एक मात्र सांगितले. मी अंधश्रद्धा निर्मूलनाची पाईक आहे. तू मला पूजा करण्याचा आग्रह करू नकोस. मोठ्या सुधीरने एमआयडीसीत लोखंडाच्या कॉटस्, कपाटे वगैरेचा छोटा कारखाना टाकलाय. त्याची पत्नी वसू बी. एड. आहे. तीही नोकरी करते. पोळ्यांना दोन्ही वेळेला बाई आहेत. मोठी सकाळचा स्वयंपाक भाजी... वरणभात वगैरे पाहते. धाकटी सकाळचा नाष्टा आणि कोरडया चटण्या वगैरे पाहते. मधली संध्याकाळचे पाहते. पहिली पाच सहा वर्षे गाडी कशी डौलात नि रूळावर चालत होती. मग नातवंडांच आगमन. मोठीला एकच मुलगा. मधलीला दोन मुलगे. धाकटीला दोन्ही मुली. मुलं वाढू लागली. त्यांच्या मनात प्रश्नांची बेटं उगवायला लागली. ... "दादी, दादू गुजराथी आहेत. आपलं आडनाव शहा आहे आणि तुझी आई माझी पंजीमा देशपांडे कशी ग?"
<noinclude>{{rh|६२ / रुणझुणत्या पाखरा||}}</noinclude> pzrrkeky0x1cdffogefqniadni0a4v1 पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७७ 104 71081 155891 2022-08-23T08:28:38Z अश्विनीलेले 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ "दादी, मंगेशच्या आजी आल्या होत्या ना? त्या काकीला म्हणत होत्या. तुझ्या धाकट्या जावेच्या मुली चित्रासारख्या देखण्या आहेत. पण शेवटी चांभारणीच्या पोरी. लग्न कशी व्हायची. तू आ..." proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="अश्विनीलेले" /></noinclude>________________ "दादी, मंगेशच्या आजी आल्या होत्या ना? त्या काकीला म्हणत होत्या. तुझ्या धाकट्या जावेच्या मुली चित्रासारख्या देखण्या आहेत. पण शेवटी चांभारणीच्या पोरी. लग्न कशी व्हायची. तू आपली वेगळी रहा. पोरं मोठी व्हायच्या आत काय ते ठरवा." शरू हे माझ्या वाढणाऱ्या नातवंडांचे प्रश्न. घरात कुरबुरींचा पाढा. आपण चाळिसबेचाळिस वर्षापूर्वी जातपातके बंधन तोड़ो' चा नारा देत विवाह केला. अरूणचे 'माळीपण' तुला कधी बोचलं नाही. तुझ्या मुलांना बोचलं नसेल; पण नातवंड?" "नीलू, घरात देवघर नसलं तरी सकाळी अंघोळ केल्यावर मी समई लावून मुलांना श्लोक म्हणायला शिकवी. अगदी 'सं गच्छध्वं संवदध्वं' सर्व जण एकमेकांची मनं जाणून घेऊ, एका विचाराने राहूया ही वेदातली प्रार्थना ते 'असतो मा सद्गमय... पासून ते मृत्योर्मा अमृत गमय' पर्यन्त ! 'अमृत' चा अर्थ सांगतांना अरूण मुलांना सांगे की असे काम करा जे अनेकांना उपयोगी होईल. सानेगुरूजी, रविन्द्रनाथ टागोर आपल्यात नसले तरी त्यांचे विचार अमर म्हणजेच चिरंतन आहेत ना? म्हणजेच ते मृत नाहीत 'अमृत' आहेत. संध्याकाळी 'शुभंकरोती' होई. तीच सवय नातवंडांनाही दिली. एकदा शैलूचा मोठा विचारत होता 'आजी आपण माळी आहोत का? गरूजी म्हाणाले माळी जात ओबीसीत येते. त्यांना सरकारकडून फी व कपडे पुस्तकांसाठी पैसे मिळतात. आम्ही अर्ज करू?' प्रश्न मला अस्वस्थ करून गेला. शरू सांगू लागली. पण लगेच उत्तर सुचले. “साहिल तुझा बाबा डॉक्टर आहे. आई त्याला मदत करते. तुम्हाला पुस्तके छान कपडे, खेळणी सगळं मिळतं ना? मग कशाला आपण अर्ज करायचा? आणि हे बघ बाळ जन्माला येतं तेव्हा त्याची जात हाता कपाळावर लिहिलेली असते का? बेटा आपण माणस आहोत. माणसाचे रंग वेगळे असले तरी ती माणसंच असतात ना? आपण प्राणी नाही. हजारो वर्षापूर्वी माणसांनी माणसांच्या उद्योग... व्यवसायावरून जाती तयार केल्या. पण आपण माणसंच. महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी. मोहन दादूचे वडील गुजराथ प्रान्तात होते म्हणून गुजराथी, कळले? असे सांगताच त्याला पटले नि पळाला खेळायला” शरयू सांगत होती. "नीलू तुझ्या मुलांचे व्यवसाय वेगळे. मुलासुनांनाही त्यांची स्वप्नं असतात. घराच्या, दैनंदिन जगण्याच्या त्यांच्या म्हणून कल्पना असतात. कळत नकळत मोठ्यांचं त्यांना दडपण वाटतं. मुलांना सुनांना एकत्र बोलाव. नाहीतरी प्रत्येकाच्या वेगळ्या मोठ्या खोल्या आहेत. मुलांची स्टडी-अभ्यासाची खोली गच्चीत तुम्हीच बांधून द्या, मुलांना प्रेमाने वेगळे राहू द्या. उद्या ती घरंही बांधतील." शरू सांगू लागली. रुणझुणत्या पाखरा/६३<noinclude></noinclude> 0x7q3o0orf04lfd3faww3jidk6t49fh