विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.1 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf 106 57614 229786 229779 2026-05-06T09:33:28Z कल्पनाशक्ती 3813 229786 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड) |Language=mr |Volume=खंड क्र.१ |Author=[[:mr:स्वामी विवेकानन्द|स्वामी विवेकानन्द]] [[:en:|Swami Vivekananda]] |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=जी. एन. कुलकर्णी |Address=मुंबई |Year=1912 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 8 ="प्रकाशकाची प्रस्तावना" 12="भगिनी निवेदिता यांचा उपोद्धात" 26="अनुक्रमणिका" 31="सर्व धर्मांच्या परिषदेपुढे दिलेली व्याख्याने" 54="आत्मा, परमेश्वर आणि धर्म" 67="हिंदुधर्म" 73="कर्मयोग" 191="धर्म म्हणजे काय?" 210="अनुभवाचा मार्ग" 225="विवेचकबुद्धि आणि धर्म" 250="आर्यज्ञानमंदिराची सोपानपंक्ति" 263="वेदांतमताचे जगावर घडलेले सुपरिणाम" 269="खासगी पत्रे"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} 45lcj1pf3juhmrqv5oeyhdaa6rgtzw6 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/266 104 63536 229783 160538 2026-05-06T09:25:17Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229783 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>प्रकट होण्यामुळे दुर्गुण उत्पन्न झाले असे नाही. या परस्परविरुद्ध अवस्था अनादि आहेत. एकीमुळे दुसरी उद्भवली असें नाही.
{{gap}}जगांतील सर्व धर्मास ही कल्पना मान्य आहे, असें वेदांताचे मत आहे. मग तो धर्म हिंदुस्थानांत जन्म पावलेला असो, अगर इतर देशांतला असो. कित्येक धर्मात ही गोष्ट पौराणिक गोष्टींच्या रूपाने दर्शित केली आहे व दुसऱ्या कित्येकांत कांहीं विशिष्ट चिन्हांच्या द्वारे दर्शविली आहे. अमुक एका विशिष्ट व्यक्तीच्या चित्तांत परमेश्वराने जन्म घेतला आणि त्या व्यक्तीच्या द्वारें धर्म निर्माण झाला असें वेदांताचे मत नाही. एकच तत्त्व असंख्य मानवी मनांच्या द्वारे व्यक्त होऊ पाहत आहे व अशा मनांच्या समवायी चिंतनाने धर्म व धर्मप्रवर्तक निर्माण झाले असें वेदांताचे मत आहे. त्याचप्रमाणे परोपकारादि भावना आणि सर्व नीतितत्वे ही सुद्धा त्याच अद्वितीय चैतन्याची व्यक्त रूपें आहेत. या शरीरांत प्रत्ययास येणारा 'मी' वास्तविक त्या शरीराइतका क्षुद्र नसून त्याचे अनंताशी साधर्म्य आहे. याचा अनुभव सामान्य मनुष्यासहि कित्येक वेळां येत असतो. परक्याच्या दुःखाने कळवळून त्यास मदत करू जाणाऱ्याची जी स्थिति त्या विशिष्ट क्षणी असते, तिचा विचार केला तर तो स्वतःचे अस्तित्व विसरून त्या परक्याशी एकजीव झालेला असतो, असे आढळून येईल. परक्याचे दुःख तें आपलेंच दुःख असें त्यास त्या क्षणी वाटत असतें. सर्व मानवी मनांची एकतानता नसती तर सहानुभूति वाटणे आणि परोपकाराची इच्छा उद्भवणे, या गोष्टी अशक्यच झाल्या असत्या. सहानुभूति, परोपकार आणि प्रेम हाच सर्व नीतिग्रंथांचा मूळपाया आहे. सर्व नीतिग्रंथांचें सार वेदांतानें ''''तत्त्वमसि'''' या एकाच सूत्रांत व्यक्त केले आहे.
{{gap}}'तत्त्वमसि' हेच वेदांताचे प्रत्येक व्यक्तीला सांगणे आहे. तुझें सर्व विश्वाशी ऐक्य असल्यामुळे सर्व प्राण्यांचे आत्मे म्हणजे तुझ्याच आत्म्याची अनेक रूप आहेत. सर्व बाह्य शरीरेंहि तुझ्या शरिराहून भिन्न नाहीत. तूं कोणाला दुखावलेस तर तें स्वतःला दुखविण्यासारखेच आहे. तूं कोणावर प्रेम केलस तर स्वतःवर प्रेम करण्यासारखेच आहे. कोणाच्याहि द्वेषाचा विकार तुझ्या चित्तांत उद्भवला तर तो इतरांस जितका हानिकारक होईल तितकाच तुला स्वतःलाहि तो हानिकारक होईल. इतरांवर केलेले प्रेमहि तुझें तुला अवश्य परत मिळेल. तूंच विश्व आहेस. तूंच अनंत आहेस. या क्षणी जरी तुझ्या अनंतत्वाचा तुला<noinclude></noinclude> b75wvo73sgg0mh717m12ln6txs7i25v पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/267 104 63537 229784 160539 2026-05-06T09:29:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229784 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२४१ }} {{rule}}</noinclude>विसर पडला आहे, तरी एका काळी तूं पूर्णत्व पावशील आणि त्यावेळी तुझ्या अनंतत्वाचा तुला प्रत्यय येईल.
{{gap}}वेदांताचे आणखी एक सांगणे असे आहे की अनेक धर्ममार्ग असणे, हेच आपणा सर्वांच्या वाढीस अवश्य आहे. सर्वांना एकाच धर्माचे अनुयायी करण्याचा प्रयत्न करूं नका. प्रत्येकाला त्याच्यापरीने अंतिम साध्य सिद्ध करण्यास मुभा देणे हेच सर्वांस हितकर आहे. सर्वांचे साध्य एकच असल्यावर मार्ग व्यक्तिशः निराळे झाले तरी काय बिघडलें? वेदांत ह्मणतो '''' आकाशात् पतितं तोयं यथा गछति सागरम् । सर्वदेवनमस्कारः केशवंप्रति गच्छति ॥''''
{{gap}}या अत्यंत प्राचीन धर्मामुळेच. बौद्ध धर्माचा उदय झाला. बुद्धाने आपले शिष्य जगभर पाठवून निद्रितांस जागृत केले. वेदांतमताचा ख्रिस्तीधर्मावरहि पर्यायानें बराच परिणाम झाला आहे. मध्ययुगांतील तत्ववेत्त्यांच्या चित्तावरहि वेदांतमताने परिणाम केल्याचे दाखले आहेत. शेवटी शेवटी जर्मन तत्ववेत्त्यांवरहि त्याचा परिणाम होऊन तत्वज्ञांच्या विचारसरणीत बरीच क्रांति घडून आली. अशा रीतीने वेदांतमताचा वस्तुतः साऱ्या जगभर जय झाला असतांहि तें काम अत्यंत शांततेने आणि कोणत्याहि प्रकारचा गाजावाजा न होतां तडीस गेले. रात्रीच्या वेळी वनस्पतींवर पडून त्यांस टवटवी आणणाऱ्या दंवाचा नाद ज्याप्रमाणे कोणासहि ऐकू येत नाही, त्याचप्रमाणे वेदांतधर्माने जगभर पसरून मानवजातीवर उपकार करण्याचे काम अत्यंत शांत आणि अगदी निःशब्द अशा रीतीने पार पाडले. अशोक राजाच्या कारकीर्दीतील कित्येक लेखांवरून बौद्धधर्माच्या प्रसाराचे कार्य कसे चालत असे, याचें अनुमान होते. त्याच्या वेळी चीन, इराण, अलेक्झांड्रिया इत्यादि लांबलांबच्या मुलखांत धर्मोपदेशक पाठविण्यात येत असत. या गोष्टी ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी तीनशे वर्षांवर घडल्या आहेत. 'परधर्मांचा अनादर बुद्धीने उल्लेख करूं नका. सर्व धर्माचें मूळ एकच आहे. तुमच्याकडून होईल तितकी मदत परकीयांस करा. तुह्माला येत असेल तें त्यांस अवश्य शिकवा. पण त्यांना अपकार होईल असें कांहीं करूं नका.' अशा प्रकारच्या आज्ञा त्यावेळी सर्व बौद्ध धर्मोपदेशकांस दिल्या जात.
{{gap}}वेदांतमताच्या प्रसारामुळेच हिंदुस्थानांत कोणाचाहि धर्मछळ असा झालाच नाही. उलट सर्व धर्माबद्दल हिंदूंच्या मनांत पूज्यबुद्धि उत्पन्न झाली. स्वतःच्या देशास मुकलेल्या यहुदी लोकांना हिंदूंपासून आश्रय मिळाला. मलबार किनाऱ्यावर त्यांचे वंशज आज हयात आहेत. पारसीकांचा छळ झाला तेव्हां त्यांनीहि<noinclude>
{{gap}}स्वा. वि. १६</noinclude> gtu2m7f2mv8zlv0jvf1e7dei2b6u5vf पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/268 104 63538 229785 160540 2026-05-06T09:31:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229785 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>हिंदुस्थानच्या भूमीचाच आश्रय केला. मुंबईचे प्रसिद्ध पारशी लोक हे त्यांचेच वंशज आहेत. सेंट टॉमस बरोबर कित्येक ख्रिस्ती लोक आले असल्याचे सांगतात. सेंट टॉमस हा खुद्द येशूच्या शिष्यांपैकीच एक होता. त्यांसहि आर्यावत आश्रय मिळाला व त्यांचेहि वंशज आजमितीस हिंदुस्थानांत आहेत. परकीयांबद्दलची आदरबुद्धि हिंदु लोकांच्या मनांतून सध्याहि नष्ट झाली नाही, व ती पुढेहि कधी नष्ट होण्याचा संभव नाही.
{{gap}}आपण सर्व मनुष्ये ज्या अर्थी एकाच साध्याकरितां खटपट करीत आहों, त्या अर्थी एकमेकांचा अनादर करण्याचे आपणांस यत्किंचिहि कारण नाही, असे वेदांतधर्माचें आग्रहाचे सांगणे आहे. एखादा मनुष्य आज कमी बुद्धीचा दिसत असला ह्मणून त्याचा द्वेष करणे आणि त्याला तुच्छ लेखणे आपणांस उचित नाही. आमच्या नेत्रांवरील पडदा कालेंकरून दूर झाला आणि आमचें अंतःकरणं शुद्ध झाले ह्मणजे आपण सर्व एकच आहों असा आपणांस प्रत्यय येईल.
{{gap}}अशी अत्युच्च स्थिति ज्याला प्राप्त झाली असेल, ही स्त्री आणि हा पुरुष, हा भेदहि ज्याच्या दृष्टीस दिसेनासा झाला असेल, हा आपला आणि हा परका ही जाणीव ज्याच्या चित्तांतून नष्ट झाली असेल, हे सर्व भेद ओलांडून जो परतीरावर प्रविष्टं झाला असेल आणि ज्याला सर्व मनुष्ये परमेश्वररूप दिसू लागली असतील, तोच खरा विश्वबंधु आणि तोच खरा वेदांती.

{{rule|7em}} {{nop}}<noinclude></noinclude> li6gxcbtpqyq5eizwx6jt5qj4z960yt पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/269 104 63539 229787 160541 2026-05-06T09:33:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229787 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xx-larger|'''खासगी पत्रे.'''}}}}

{{nop}}<noinclude></noinclude> 2scaeb624bd6ms3nk5hy2d49wm0xd81 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/270 104 63540 229788 160542 2026-05-06T09:39:51Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229788 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|'''खासगी पत्रे.'''}}}} {{rule|5em}} {{center|'''पत्र १ लें.'''}} {{right|न्यूयॉर्क, ता. ९ एप्रिल १८९४.}} प्रिय --
{{gap}}सेक्रेटरीसाहेब आपल्या पत्रांत मला तिकडे येण्याविषयी लिहितात. ते म्हणतात, "तुमचे कर्तव्यक्षेत्र हिंदुस्थानच आहे " ही गोष्ट खरी आहे. परंतु साऱ्या हिंदुस्थानभर जागृति उत्पन्न होईल असें करावयाचे हे आपणांस लक्षांत ठेविले पाहिजे. यासाठी कोणत्याहि गोष्टींत घाई उपयोगाची नाही. भगवंताची कृपा असेल तर सर्व गोष्टी ठीकठाक होतील.
{{gap}}अमेरिकेतील पुष्कळ मोठ्या शहरी माझी व्याख्याने झाली. येथे मला मित्रही बरेच मिळाले आहेत, आणि त्यांत कित्येक फार वजनदार गृहस्थ आहेत. आतां ही गोष्ट खरी आहे की, जुन्या पद्धतीचे ख्रिस्ती दीक्षित माझ्याविरुद्ध आहेत. तात्विक विचाराच्या बुद्धिवादांत माझ्याशी दोन हात करणे ही गोष्ट सोपी नाही हे ते पूर्णपणे जाणून असल्यामुळे, माझ्या मार्गात अडथळा आणणे, मला गालिप्रदान करणे व शक्य त्या रीतीने माझी नाचक्की होईलसें करणे, अशा मार्गाचा त्यांनी अंगिकार केला आहे. परमेश्वर त्यांना सुखी करो! कोणतेंहि सत्कार्य आपण करूं लागलों म्हणजे त्यांत अडथळे हे येणारच. असल्या अडथळ्यांनां न जुमानतां एकसारखे पुढे पाऊल टाकणारा धीर पुरुष मात्र नेहमी यशस्वी होतो.
{{gap}}एक जात, एक धर्म, शांति व मित्रभाव ही ज्या काली जगांत एकत्र नांदूं लागतील तेच सत्वयुग. ही सत्वयुगाची कल्पना भरतभूमीत रुजली म्हणजे तिला जागृति येईल.
{{gap}}उठा, माझ्या मुलांनो, आणि एकदम या कार्यास लागा!
{{gap}}जुन्या हिंदुधर्माचा जयजयकार असो! तुम्ही कामास सुरवात केली की यश हे ठेवलेलेंच. आपण कामास एकवेळ सुरवात केली, की ढोलके बडवणारे वाटेल तितके मिळतील. परंतु कामाशिवाय नुसती बडबड मला नको आहे. ईश्वर आपणांस सुखी राखो.
{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}} {{nop}}<noinclude></noinclude> 39zh21xaqdc5hm2egf1z0z0ahugv2dd पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/271 104 63541 229789 160543 2026-05-06T09:49:00Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229789 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>{{center|'''पत्र २ रे.'''}} प्रिय--
{{gap}}कलकत्त्याच्या टाऊन हालांत सभा भरून पास झालेल्या ठरावांची नक्कल मला मिळाली. तसेच माझ्या देशबांधवांनी मला पाठविलेला प्रेमसंदेशहि पोहोचला.
{{gap}}माझ्या हातून जी थोडीबहुत सेवा होत आहे, ती तुम्ही गोड करून घेतां याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे.
{{gap}}इतर राष्ट्रांशी अगदी तुटून राहावयाचे, असा बाणा बाळगणारे कोणतेंहि राष्ट्र जिवंत राहावयाचे नाही, अशी माझी पक्की खात्री झाली आहे. स्वतःच्या मोठेपणाच्या खोट्या कल्पनांनी, अथवा ऐहिक फायद्याकरितां राजनीति म्हणून, अथवा स्वतःचा पवित्रपणा कायम राखण्यासाठी जेव्हां एखाद्या राष्ट्रांत वरील वृत्तीचा उदय होतो तेव्हां तें राष्ट्र विनाशाच्या मार्गास लागले म्हणून समजावें.
{{gap}}शेजारच्या बौद्धधर्मी राष्ट्रांचा संपर्क आपल्या हिंदुत्वास बाधक होईल म्हणून विशिष्ट जातिबंधनांचा तट ज्या काली हिंदुसमाजाभोवती उभारला गेला, तेव्हांच त्याच्या कोंडमाऱ्यास सुरुवात झाली असे मला वाटते. अशा कोंडमाऱ्याचा अवनति हा निश्चित परिणाम आहे.
{{gap}}परकीयांचा द्वेष जो आमच्या हाडीमाशी खिळला आहे, त्याला कितीहि धार्मिक रूप दिले, तरी द्वेषाचा निश्चित परिणाम जी अवनति, ती टाळता येणे शक्य नाही. कोणत्याही कारणासाठी का होईना, तुम्ही परद्वेष करूं लागलां म्हणजे तुमचीच अवनति होणार ही नियति आहे. जो देश एकाकाळी सर्व भूगोलाचा पुढारी व मार्गदर्शक होता, तोच आतां इतर राष्ट्रांचा हास्यविषय होऊन बसला आहे! जणूं काय वरील सिद्धांताची सत्यताच तो कंठरवाने सांगत आहे! जो सिद्धांत आमच्या पूर्वजांनी शोधून काढिला व ज्याचा सर्वत्र प्रसार कला त्या सिद्धांताचे उल्लंघन केल्याचा काय परिणाम होतो, हे जणूं काय आम्ही वस्तुपाठदर्शनाने जगास शिकवीत आहों!
{{gap}}परस्पर विनिमय अथवा 'दे वाण घे वाण' हा विश्वाचा नियम आहे. आणि आपली उन्नति व्हावी असे वाटत असेल तर आपणांपाशी असलेला निधि उघडून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांनी त्याचा उपयोग करावा, अशी परवानगी भरतभूमीने दिली पाहिजे; तसेच इतर राष्ट्रांपाशी जें जें म्हणून घेण्याजोगे आढळेल, त्याचा तिने स्वीकार केला पाहिजे. दिवसेंदिवस वाढत जाणे, मोठे होत जाणे हे जीवंतपणाचे चिन्ह आहे. तसेंच आकुंचित होणे हे मृत्युपंथास लागणे होय. अजात-<noinclude></noinclude> q53f01fh6mmephsn7zvk16uy3l43krz पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/272 104 63542 229790 160545 2026-05-06T09:57:18Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229790 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२४७ }} {{rule}}</noinclude>शत्रुत्व हे खरें जीवित आणि परद्वेष हा ठराविक मृत्यु होय. ज्या दिवशी आम्ही परकीयांचा द्वेष करूं लागलों, त्याच दिवशी आमच्या राष्ट्रपुरुषाच्या नाड्या बंद पडण्यास सुरुवात झाली; आणि आतां तो मार्ग सोडून आम्ही परत न फिरलों तर निश्चयाने मृत्यु येणारच.
{{gap}}भूतलावरील सर्व जातीच्या लोकांशी मिळून मिसळून आम्हांस वागले पाहिजे. यासाठी जो जो हिंदुमात्र परराष्ट्रगमन करितो, तो आपल्या जन्मभूमीचा खरा मित्र आहे. गवताच्या गंजीवरील कुत्र्याप्रमाणे स्वतः खावयाचें नाहीं व दुसऱ्यास खाऊं द्यावयाचें नाही असा बाणा बाळगणारे खुळसट धर्ममार्तंड आपल्या मातृभूचे खरे शत्रु होत. ज्या इमारतीकडे पाहून तोंडांत बोट घालावें, असली राष्ट्रीय इमारत पाश्चात्य राष्ट्रांनी सध्याच्या काळी उठविली आहे. उत्कृष्ट दानत असणारी माणसें ही या इमारतीचे आधारस्तंभ आहेत; आणि अशी हजारों- लक्षावधि-माणसें आमच्यांत निर्माण होईपर्यंत या अथवा त्या पाश्चात्य राष्ट्राविरुद्ध गिल्ला करून फळ काय?
{{gap}}दुसऱ्यांस स्वातंत्र्य देण्यास जे तयार नाहीत, ते स्वतः स्वातंत्र्यास योग्य आहेत काय? शांत मनाने आणि खऱ्या मर्दपणाला उचित अशा मार्गाने आपण सारे कामास लागू या. निष्कारण तंटेबखेडे आणि परद्वेष आतां पुरे. जो कोणी ज्या स्थितीत राहण्यास अंगच्या गुणांनी योग्य झाला, त्याला ती स्थिति प्राप्त होऊ न देण्याची शक्ति या साऱ्या विश्वरचनेत कोणाच्याहि अंगीं नाहीं, अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे. गतकाली आम्ही वैभवशाली होतो हे खरें, पण भविष्यकाळी त्याहूनहि अधिक मोठे आम्ही होणार असें माझें मन मला सांगत आहे. शांतता, धीर आणि अविरत काम करण्याचा उत्साह, भगवान् शंकराच्या कृपेने आम्हांमध्ये सदैव राहो इतकीच माझी प्रार्थना आहे.
{{right|आपला,}}{{right|'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}} {{nop}}<noinclude></noinclude> n0bf492a5iejfnhy2e4wwqfpvsfdpqz 229791 229790 2026-05-06T09:58:14Z कल्पनाशक्ती 3813 229791 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२४७ }} {{rule}}</noinclude>शत्रुत्व हे खरें जीवित आणि परद्वेष हा ठराविक मृत्यु होय. ज्या दिवशी आम्ही परकीयांचा द्वेष करूं लागलों, त्याच दिवशी आमच्या राष्ट्रपुरुषाच्या नाड्या बंद पडण्यास सुरुवात झाली; आणि आतां तो मार्ग सोडून आम्ही परत न फिरलों तर निश्चयाने मृत्यु येणारच.
{{gap}}भूतलावरील सर्व जातीच्या लोकांशी मिळून मिसळून आम्हांस वागले पाहिजे. यासाठी जो जो हिंदुमात्र परराष्ट्रगमन करितो, तो आपल्या जन्मभूमीचा खरा मित्र आहे. गवताच्या गंजीवरील कुत्र्याप्रमाणे स्वतः खावयाचें नाहीं व दुसऱ्यास खाऊं द्यावयाचें नाही असा बाणा बाळगणारे खुळसट धर्ममार्तंड आपल्या मातृभूचे खरे शत्रु होत. ज्या इमारतीकडे पाहून तोंडांत बोट घालावें, असली राष्ट्रीय इमारत पाश्चात्य राष्ट्रांनी सध्याच्या काळी उठविली आहे. उत्कृष्ट दानत असणारी माणसें ही या इमारतीचे आधारस्तंभ आहेत; आणि अशी हजारों- लक्षावधि-माणसें आमच्यांत निर्माण होईपर्यंत या अथवा त्या पाश्चात्य राष्ट्राविरुद्ध गिल्ला करून फळ काय?
{{gap}}दुसऱ्यांस स्वातंत्र्य देण्यास जे तयार नाहीत, ते स्वतः स्वातंत्र्यास योग्य आहेत काय? शांत मनाने आणि खऱ्या मर्दपणाला उचित अशा मार्गाने आपण सारे कामास लागू या. निष्कारण तंटेबखेडे आणि परद्वेष आतां पुरे. जो कोणी ज्या स्थितीत राहण्यास अंगच्या गुणांनी योग्य झाला, त्याला ती स्थिति प्राप्त होऊ न देण्याची शक्ति या साऱ्या विश्वरचनेत कोणाच्याहि अंगीं नाहीं, अशी माझी पूर्ण खात्री झाली आहे. गतकाली आम्ही वैभवशाली होतो हे खरें, पण भविष्यकाळी त्याहूनहि अधिक मोठे आम्ही होणार असें माझें मन मला सांगत आहे. शांतता, धीर आणि अविरत काम करण्याचा उत्साह, भगवान् शंकराच्या कृपेने आम्हांमध्ये सदैव राहो इतकीच माझी प्रार्थना आहे.
{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}} {{nop}}<noinclude></noinclude> 1zbusj62u5ie4z8js5ujj6qwlu7yjbb पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/273 104 63543 229792 160547 2026-05-06T10:12:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229792 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}} {{rule}}</noinclude>{{center|'''पत्र ३ रे'''}} {{right|ता० ३० नोव्हेंबर १८९४.}} प्रिय-
{{gap}}धर्मप्रसाराचे काम करण्याकरितां तयार झालेल्या संघाची नियमबद्ध रचना असावी हे चांगले; परंतु ही नियमबद्धता निवळ व्यावहारिक कामांपुरतीच असली पाहिजे. धार्मिक बाबींसंबंधी अशा नियमबद्धतेचा उपयोग केला, तर त्यामुळे नवाच धार्मिक पंथ उत्पन्न होण्याची भीति असते. नवा धर्मपंथ होऊ नये अशाबद्दल आपण खबरदारी घेतली पाहिजे.
{{gap}}भगवान् श्रीरामकृष्णांचे चरित्र लिहिण्याची कोणास इच्छा असली तर कोणत्या कार्यासाठी ते अवतरले व त्यांनी कशाचा बोध केला हे कळण्याजोगें तें चरित्र पाहिजे नाही तर किरकोळ गोष्टींचे वर्णन करून त्यांच्या चारित्र्याचे भलतेंच स्वरूप लोकांपुढे त्याने मांडूं नये. त्यांचे प्रेममय जीवित, त्यांचे ज्ञान, त्यांचा उपदेश आणि त्यांचा धर्ममय आयुष्यक्रम ही ज्यांत व्यक्त होतील असें चरित्र के-नें लिहावें. हिंदुधर्माचे वास्तविक स्वरूप काय आहे, हे प्रत्यक्ष स्वरूपानें कळावे, याकरितांच त्यांचा प्रखर जीवितदीप प्रज्वलित झाला होता. शास्त्रांनी जें परोक्ष ज्ञान सांगितले, तेच ज्ञान रोजच्या सामान्य आचरणांत कसें व्यक्त करावें, याचा वस्तुपाठ त्यांच्या आयुष्यक्रमावरून मिळण्याजोगा आहे. पूर्वकाली जे अवतार झाले व अनेक ऋषि उत्पन्न झाले, त्यांचे वास्तविक कार्य काय होते, तें भगवानांच्या चरित्रामुळे आपणांस आज कळण्याजोगे आहे. शास्त्रांतील अव्यक्त ज्ञानतत्वांचें व्यक्तरूप- व्यावहारिक रूप- ह्मणजे श्रीरामकृष्णांचें चरित्र होय. भारतीय राष्ट्रपुरुषाने जें ज्ञान पांच हजार वर्षांत मिळविले, त्याचे व्यक्तस्वरूप ५४ वर्षांच्या आयुरवधींत प्रगट करून भावी पिढ्यांकरितां तो ज्ञानमार्ग भगवान् रामकृष्णांनी प्रकाशित करून ठेविला आहे. व्यक्तीच्या अधिकारपरत्वें ज्ञानमार्गाचे स्वरूप बदलतें असें भगवानांचे मत होते व हे मत आपण लक्ष्यांत ठेविलें ह्मणजे वेद व शास्त्रे यांत परस्परविरुद्ध भासणाऱ्या सिद्धांताची एकवाक्यता होते. परकीयांचा आयुष्यक्रम आपणांस न पटला तरी त्यासंबंधी केवळ उदासीन न राहतां आपण शुद्ध बंधुप्रेमाने त्याच्याशी वागले पाहीजे असें भगवान् ह्मणत असत. आणि सर्व धर्मांचा मूलभूत सिद्धांतहि हाच आहे. भगवानांच्या चरित्राची ही रूपरेषा ध्यानांत धरून त्यांचे सुंदर आणि परिणामकारक चरित्र लिहिता येईल. असो; योग्य वेळी सर्व गोष्टी होतील.{{nop}}<noinclude></noinclude> 9m9evq9qjingjl43a32sr5fohqppa2c पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/274 104 63544 229793 160548 2026-05-06T10:19:31Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229793 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२४९ }} {{rule}}</noinclude>{{gap}}आपण आतां पुढील कर्तव्यास स्वतःच्या हिंमतीवरच सुरुवात करा. स्वयंपाक तयार झाला ह्मणजे पंक्तिबारगीर हवे तितके जमतील. आतां काळजीपूर्वक कामास लागा.
{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}
{{center|'''पत्र ४ थे.'''}} {{right|ता. ३० नोव्हेंबर १८९४.}} प्रिय के.-
{{gap}}भगवान् श्रीरामकृष्णांनी काय काय चमत्कार केले, हे प्रसिद्ध करणाऱ्या मूर्खाच्या नादी आपण लागू नये. त्या गोष्टी खऱ्या आहेत; पण असल्या मूर्खपणाने चरित्राचा प्रमुख भाग आणि गौण भाग यांचा घोटाळा मात्र होतो. चमत्कारांसारख्या अप्रस्तुत आणि निरर्थक गोष्टी सांगून काय फायदा? वास्तविक त्यांनी जो ज्ञानोपदेश केला तोच सांगितला पाहिजे. चमत्कारांनी कोणतेंहि प्रमेय सिद्ध होत नाही. जड गोष्टींनी चैतन्याची सिद्धि होत नाही. परमेश्वराचे स्वरूप आणि अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप व नित्यता इत्यादि प्रमेये आणि चमत्कार यांचा काही तरी परस्परसंबंध आहे काय? भगवानांचा ज्ञाननिर्झर लोकांसाठी मोकळा करा. जें ज्ञानामृत पिऊन तुझी तृषा शांत झाली, तेंच ज्ञानामृत इतरांस पाज. चमत्कारांविषयी विचार करून आपला मेंदू व्यर्थ शिणवू नको, आणि असल्या वेडगळ गोष्टी सांगून इतरांसही त्रास देऊं नको.
{{right|तुझा,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}
{{center|'''पत्र ५ वे.'''}} प्रिय-
{{gap}}माझ्यासंबंधीं मिशनरी पत्रांत वेडावांकडा मजकूर लिहिलेला असतो असें कधी कधी माझ्या कानी येते; परंतु त्याकडे मी कधीहि लक्ष्य देत नाही. हिंदुस्थानांतल्या पत्रांतील असे उतारे तुम्ही मला पाठविले तर त्यांस मी खचित केराच्या टोपलीत टाकीन. आमच्या कार्याकडे लोकांचे लक्ष्य लागावें म्हणून थोडासा गाजावाजा पाहिजेच होता; परंतु आतां त्याचा अतिरेक होऊ देतां उपयोगी नाही. आतां माझी कोणी निंदा अथवा स्तुति केली तरी दोहींकडे तुम्ही लक्ष्य देऊ नये, हे बरें.<noinclude></noinclude> hkpt8dgehtz8lzb15ubnkswp51ypaxi