विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.1
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/275
104
63545
229794
160551
2026-05-06T15:38:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229794
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>तुम्ही आपले काम करीत असावे, हे बरें. कोणी काही म्हटले तरी ''''न हि कल्याण कृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति'''' हे भगवान् श्रीकृष्णाचे वचन आपण नेहमी ध्यानांत ठेवावें. माझ्या धर्मशिक्षणाचे रहस्य समजून घेऊ इच्छिणारांची संख्या येथे दिवसेंदिवस वाढत आहे. ''''जो निंदेते नेधे । स्तुति न श्लाघे ।'''' अशा प्रकारचे वर्तन ठेवण्याचा निश्चय मी केला असल्याचे आपणांस पूर्वी कळविलें आहेच आणि आतांहि कळवितों. मला कोणी असले उतारे पाठविले तर ते मी 'भस्मसात्' करितों आणि आपणहि तसेंच करावें. आपण आपले कर्तव्य खऱ्या अंतःकरणाने करीत असलें ह्मणजे शेवटी सर्व गोष्टी सुरळीत होतात. ''''सत्यमेव जयते'''' हा नेहमीचाच सिद्धांत आहे.
{{gap}}आपणाविषयी लोकांचा गैरसमज होण्याजोगे लेख ख्रिस्ती मिशनरींनी लिहिले तर त्यांजकडे आपण लक्ष्य देऊं नये, हा उत्तम पक्ष. अशा लेखांची पूर्ण उपेक्षा करणे हेच त्यांस खरें उत्तर आहे.
{{gap}}एस्- यांस आपल्या संघाचे अध्यक्ष करा. ते दिलदार आणि खऱ्या अंतःकरणापासून काम करणारे गृहस्थ आहेत. आतां माझ्याकडून मदतीची फारशी अपेक्षा न करितां कामास सुरुवात करा. मी तिकडे केव्हां परत येईन हे आज मला सांगतां येत नाही. मी येथें जें कार्य करीत आहे तेंहि माझ्या मातृभूमीसाठीच आहे. सर्वांस माझा पूर्ण आशीर्वाद सांगावा. ईश्वर आपले कल्याण करो.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}

{{rule|5em}}

{{center|'''पत्र ५ वें.'''}}
{{right|शिकागो, ता.-९४}}
प्रिय-

{{gap}}तुमचें पत्र आतांच पावलें. दोन तीन वर्षे व्याख्याने देऊन पैसे मिळविणे हे या देशांत फारसें कठीण नाही. यासंबंधी मी थोडासा प्रयत्न करून पाहिला. पैशाच्या दृष्टीने माझा प्रयत्न यशस्वी होईल इतका पाठिंबा लोकांकडूनही मला मिळाला; परंतु ही गोष्ट मला स्वतःलाच अप्रशस्त व माझ्या संन्यस्तवृत्तीला कमीपणा आणणारी वाटू लागली.
{{gap}}हिंदुस्थानांतील काही पत्रांनी मजवर केलेली टीका माझ्या अवलोकनांत आली. परंतु अशी टीका होणे, हे भरतभूमीच्या सध्याच्या स्थितीत रीतसरच आहे.<noinclude></noinclude>
2hxtnb99fhgr1lr94zw8vhb7lt6s4xj
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/276
104
63546
229795
160554
2026-05-06T15:42:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229795
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२५१ }}
{{rule}}</noinclude>गुलामगिरीत वाढलेल्या समाजांत परोत्कर्षासहिष्णुता उत्पन्न होणे, हे रास्तच आहे. या दुर्गुणाच्या जोडीस भेदभाव येऊन मिळाला ह्मणजे गुलामगिरीच्या शृंखलेचे सांधे पक्के होतात. हिंदुस्थानांतून बाहेर पडून इतर देशांच्या स्थितीचें अवलोकन केलें ह्मणजे वरील सिद्धांताची सत्यता चांगली पटते. पाश्चात्यांना चोहोंकडे जो एकसारखा जय येत आहे, त्याची मुख्य कारणे परस्पर विश्वास आणि संघशक्ति ही होत. कोणतेही राष्ट्र एकवेळ दुर्बळ आणि भेकड झाले ह्मणजे विश्वासघाताच्या पातकाचे बी तेथे चांगले रुजू लागते.
{{gap}}माझ्या बाळा, गुलामगिरीत खितपत असलेल्या जनसमाजाकडून तूं कसल्याहि मदतीची अपेक्षा करूं नको. सध्याची परिस्थिति अत्यंत बिकट- अत्यंत निराशाजनक आहे, ही गोष्ट खरी, परंतु तिजविषयी माझे ह्मणणे मोकळेपणाने मी तुह्मां सर्वांस सांगतो. आमच्या सध्यांच्या समाजास कसली महत्वाकांक्षाच उरली नाही. भविष्यकालीं आपण आपली स्थिति उच्च प्रतीची करूं असा आत्मविश्वास तर त्यांच्या ठिकाणी नाहींच; पण दुसरा कोणी त्यांच्यासाठी मनापासून खटपट करूं लागला, तर त्याच्या कांटे पसरण्याचे काम करण्यास मात्र हवे तितके लोक तयार होतात. असल्या मृत्पिडांच्या समाजांत थोडे तरी चलनवलन-थोडी तरी जीवनकला- उत्पन्न करण्याचे सामर्थ्य तुमच्यांत आहे काय? एकादें अत्यंत हट्टी मूल औषध पितांना जसें वैद्याला लाथा मारितें, तसा आमचा समाज आहे. त्या वैद्याचे चातुर्य तुमच्या अंगी आहे काय? एखादा अमेरिकन अथवा युरोपियन गृहस्थ परदेशांत आपल्या देशबांधवाला नेहमी मदत करीत असतो.
{{gap}}''''कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।'''' या भगवंताच्या वाक्याचे मी पन्हां एकवेळ तुला स्मरण देतो. परिस्थिति कशीहि असो, आपण नेहमीं पर्वताप्रमाणे अढळ राहिले पाहिजे. सत्याचा जय केव्हां ना केव्हां तरी होणारच. भगवान श्रीरामकृष्णांच्या मुलांस उत्तम आत्मविश्वास प्रथम पाहिजे. आपल्या सदसद्विवेकबुद्धीच्या विरुद्ध केव्हांहि वागावयाचें नाहीं असा पक्का निश्चय पाहिजे; ह्मणजे सर्व काही सुरळित होईल. आपल्या कार्याचा उत्तम परिपाक स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याइतके आयुष्य कदाचित आपणांस प्राप्त होणार नाही, पण आपल्या कार्याचा शेवट उत्तम होणार, याबद्दल तिळमात्र शंका नको. भरतभूमीच्या मृतप्राय देहांत चैतन्य भरेल, तिला नवजीवन प्राप्त होईल असे प्रयत्न सध्या हवे आहेत. असे प्रयत्न यशस्वी होण्यास अधिक काळ लागेल हे उघडच<noinclude></noinclude>
7ky1srgik2e5v0acd6kssgke4vjd8va
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/277
104
63547
229796
160556
2026-05-06T15:45:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229796
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>आहे. आपण अशा प्रयत्नांस सुरुवात केली आहे, या विचारांतच सध्या आपण आनंद मानिला पाहिजे. ''''देहं वा पातयेत् अर्थं वा साधयेत्'''' अशा प्रकारची श्रद्धा, अंतःकरणाचे पावित्र्य आणि कामाची शिकस्त इतकी तयारी तुझ्याजवळ जय्यत पाहिजे. भगवान् रामकृष्णांच्या शिष्यवर्गात काही विशेष गुण ह्मटला, तर खरें अंतःकरण हा पाहिजे. असली शंभर माणसे मला मिळाली व ती मी दर्शविलेल्या मार्गानें कार्य करूं लागली, ह्मणजे माझें कर्तव्य संपलें असें मला वाटेल व समाधानाने हा देह ठेवण्यास मी तयार होईन. परमेश्वराची मर्जी असेल तर तसे होईल! अज्ञ लोकांनी तुझ्याविरुद्ध कितीहि बडबड केली तरी त्यांच्या ह्मणण्याकडे तूं लक्ष्य देऊ नको. आपण कोणाकडून मदतीची अपेक्षा करूं नये; पण ती चालून आली तर तिचा त्यागहि करूं नये. आपण भगवंताचे पट्टेवाले आहों, हे विसरता कामा नये. क्षुद्र कीटकांनी त्रास देण्याचा यत्न केला तर त्याकडे उपेक्षा दृष्टीने पहावें. पुढे, एकसारखें पुढे चला. सत्यमार्गातला एक शब्दहि फुकट जात नाही. राखेच्या दडपणांत अग्नि जसा गुप्त राहतो, तसा तो शब्द कदाचित् युगानुयुगेंहि गुप्त राहील; परंतु त्यांतील प्रखरता यत्किंचिहि कमी होणार नाही. त्याचा प्रकाश पडण्याची वेळ केव्हांनाकेव्हां तरी येईलच. सत्य, सद्गुण आणि पावित्र्य ही आत्म्याप्रमाणेच अच्छेद्य आणि अदाह्य आहेत. खऱ्या अंतःकरणानें काम करणारा एकहि मनुष्य मला पुरे. खोगीर भरतीची हजारों मनुष्ये माझ्या कामाची नाहीत. माझ्या मुला, तूं आपल्या कर्तव्याला पक्का चिकटून रहा. तुझा पाठीराखा परमेश्वर असतां, व तो तुला मदत देण्यास तयार असतां मनुष्यांच्या मदतीची इच्छाच तूं करूं नयेस. जोपर्यंत तुझ्या अंतःकरणांत आत्मविश्वास पक्का आहे आणि परमेश्वरावरचा तुझा भरंवसा पक्का आहे, तोपर्यंत तुझा मार्ग सरळच आहे असें तूं समज. तुझें नुकसान करण्यास कोणीही समर्थ नाही. परमेश्वराला अंतःकरणापासून आळव ह्मणजे भोंवतीं गाढ अंधकार पडला असला तरी तुला दीपदर्शन होईल आणि तुझा मार्ग तुला स्पष्ट दिसेल. मी तुझ्या बऱ्यासाठी रोज प्रार्थना करितो तसेंच तूंहि माझ्याकरितां रोज करीत जा. खोटी धर्मबंधनें, जुलूम आणि दारिद्र्य या त्रिविध तापांनी पोळून गेलेल्या आपल्या कोट्यवधि बांधवांसाठी आपणांपैकी प्रत्येकाने रोज प्रार्थना करीत राहिले पाहिजे. खऱ्या धर्माची जरूरी सध्या श्रीमंत आणि मोठे लोक यापेक्षां माझ्या गरीब बांधवांसच अधिक आहे. मी काही चमत्कार करून दाखविणारा योगी नाही, तत्ववेत्ता नाही आणि साधुहि नाही. तर मी एक अगदी कंगाल मनुष्य आहे,<noinclude></noinclude>
jsxthn2g63ae5amuw0uqg1aka79cjnd
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/278
104
63548
229797
160557
2026-05-06T15:48:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229797
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२५३ }}
{{rule}}</noinclude>आणि ह्मणूनच माझें कंगाल मनुष्यांवर प्रेम असणे साहजिक आहे. या देशांतील गरीब लोक आणि त्यांच्या बऱ्याकरितां खटपट करणारे हे माझ्या अवलोकनांत येत आहेत. आमच्या हिंदुस्थानची स्थिति येथील स्थितीशी ताडून पाहतां केवढे अंतर दिसू लागतें! दारिद्र्यांत आणि अज्ञानपंकांत रुतून गेलेल्या कोट्यवधि लोकांची यत्किंचित् तरी काळजी वाहणारे हिंदुस्थानांत किती लोक आहेत? घरोघर फिरून त्यांस ज्ञानदान करणारा कोणी हरीचा लाल आहे काय? गाढ अंधकारांत प्रकाशाचा एक किरण तरी त्यांस पोहोचविण्यास कोणी तयार आहे काय? निदान मनाने तरी त्यांच्या बऱ्यासाठी चिंतन करणारा कोणी आहे काय? ज्यांची आजपर्यंत सर्वत्र उपेक्षा झाली आहे, अशा रंजल्यागांजलेल्यांस तूं आपले ह्मण, त्यांच्या बऱ्यासाठी प्रार्थना कर आणि सुचेल तें काम करण्यास सुरुवात कर, ह्मणजे परमेश्वरच तुझा वाटाड्या होईल. ''''जे का रंजले गांजले । त्यांसि ह्मणे जो आपुले । तोचि साधु।'''' तोच महात्मा; आणि इतर साधूसारखे दिसणारे लोक दुरात्मे होत! परमेश्वराचे स्मरण करून आपण सारेच उद्योगास लागू या. आपल्या कृतीला दृश्य फळ कदाचित् लवकर येणार नाही. आपल्याकरितां कोणी आनंदप्रदर्शक सभा भरविणार नाही; फार काय, आपण मृत्युवश झालों तर आपणाकरितां एक अश्रुढाळणाराहि कोणी मिळणार नाही. पण असे झाले तरी आपली कृति फुकट गेली, फलहीन झाली असें तुला वाटू देऊ नको. कृतीच काय, पण मनांत उद्भूत झालेला एक विचारहि फुकट जात नाही हे लक्ष्यांत ठेव. लवकर अथवा उशिरां त्याचा परिणाम झालाच पाहिजे. मित्रा, माझें अंतःकरण आतां अगदी भरून आले आहे. माझ्या अंतःकरणांतील विचार व्यक्त करण्याचे सामर्थ्य शब्दांत नाही. परंतु तुला सर्व ठाऊक आहेच; आणि कल्पनेनें तें तुला जाणतां येते. माझे कोट्यवधि बांधव निरक्षर आणि बुभुक्षित असतां त्यांच्याच खर्चाने सुशिक्षित होऊन त्यांची यत्किंचिहि काळजी न करणाऱ्या प्रत्येक मनुष्यास मी देशद्रोही- बंधुद्रोही समजतो. भुकेने कंठाशी प्राण आलेल्या माझ्या बांधवांकरितां यत्किंचितहि काळजी न करतां नटून सजून कोंबड्याप्रमाणे छाती वर करून चालणाऱ्यांस धिःकार असो. प्रियबंधु, आपण भिकारी आहों, अगदी क्षुद्र आहों, ही गोष्टी खरी; परंतु आपण ''''मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरीम्।'''' अशाचे चाकर आहों, हे विसरूं नको. ईश्वर तुह्मा सर्वांचे कल्याण करो.
{{right|आपला,
'''विवेकानंद'''}}
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
3scesso7rz25bka2wgd0e97whth9p7f
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/279
104
63549
229798
160559
2026-05-06T15:54:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229798
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{center|'''पत्र ६ वे'''}}
{{right|न्यूयॉर्क.}}
प्रिय-

{{gap}}यंदा येथे अतिशय थंडी पडली होती, तरी या देशाच्या बऱ्याच भागांत मी प्रवास केला. थंडीमुळे मला फार त्रास होईलसें वाटले होते पण तसे झाले नाही. तुझ्या कामाला यश येईल अशी आशा करूया. ''''बहुजन हिताय, बहुजन सुखाय'''' ज्याचा अवतार झाला त्याचा तूं ताबेदार. मग अपयश तुला शिवेल तरी कसे?
{{gap}}ख्रिस्ती धर्माचा उपदेश करण्याची जी पद्धत आपणांस हिंदुस्थानांत दिसून येते, त्याहून इकडील पद्धत निराळी आहे. येथील अनेक मतांच्या धर्माधिकाऱ्यात कित्येक माझे चांगले स्नेही झाले आहेत, हे ऐकून तुला खचित नवल वाटेल. हिंदुलोकांप्रमाणे परर्धमसहिष्णु आणि खरे उदारमतवादी असे ख्रिस्ती धर्मोपदेशक येथे किती तरी आहेत. ज्याला धर्मज्ञानाची खरी लालसा आहे, असा मनुष्य कोठेहि जन्मास आला तरी तो अंतःकरणानें उदारच असणार. धर्मप्रेम अंतःकरणांत उद्भवले म्हणजे त्याचे विचार आपोआपच उदार होतात. धर्मज्ञानदान ह्मणजे पोटाचा एक व्यवसाय असें झालें ह्मणजे इतरांशी मत्सर, चढाओढ, निंदकवृत्ति, अनुदारता इत्यादि अनेक दुर्गुण अंतःकरणांत आपोआप उद्भवू लागतात.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र ७ वे.'''}}
{{right|न्यूयॉर्क-१८९४.}}
प्रिय-

{{gap}}आज एक जुनी दंतकथा मी तुला सांगणार आहे, तिजकडे नीट लक्ष्य दे.
{{gap}}एके दिवशी कोणी एक आळशी मनुष्य एका वृद्ध गृहस्थाच्या दाराशी जाऊन त्याला एका गांवाचा रस्ता विचारूं लागला. परंतु त्याच्या प्रश्नास त्या वृद्ध गृहस्थानें कांहींच जबाब दिला नाही. तोच प्रश्न त्या मनुष्याने पुनःपुनः कित्येक वेळा विचारला, परंतु त्या वृद्ध गृहस्थाचें तोंड उघडले नाही. त्या वृद्धाच्या या कृतीचा त्या मनुष्यास फार राग येऊन तो तेथून जाण्यास निघाला. तेव्हा वृद्ध ओरडून ह्मणतो, "अहो, तें गांव येथून समोरच एक मैलावर आहे." आळशी मनुष्य म्हणतो "आजोबा, मी जेव्हां आपणास प्रथमच प्रश्न केला. तेव्हां आपण<noinclude></noinclude>
4egypwvon08alb4658762xx89pbfk2n
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/280
104
63550
229799
160561
2026-05-06T15:57:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229799
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२५५ }}
{{rule}}</noinclude>उत्तर कां दिले नाही.?" वृद्ध ह्मणतो, "बाबा, तुला खरेंच त्या गांवास जावयाचे आहे असे मला तुझ्या विचारण्याच्या पद्धतीवरून वाटले नाही. तूं खरोखरच जावयास निघालास तेव्हां तुला योग्य मार्ग दाखविणे मला भाग पडलें."
{{gap}}माझ्या मुला, ही गोष्ट तूं सदोदित लक्ष्यांत बाळग. तूं मनापासून कामास आरंभ केलास की तुला मार्गदर्शक भेटेलच भेटेल. ''''अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥१॥'''' असें भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत वचन दिले आहे. ते सत्य आहे, हे नेहमी लक्ष्यांत ठेव. हे वचन ह्मणजे स्वप्नांत दिलेले वचन असे समजू नको.
{{gap}}लोकांस खऱ्या धर्ममार्गाचा उपदेश करणे व अडचणीच्या प्रसंगी कायावाचामनाने त्यांच्या उपयोगी पडणें हें सांप्रतचे तुमचे कर्तव्य आहे. दर आठवड्यास एकत्र जमण्यासाठी एखादी लहानशी जागा घेऊन तेथे उपनिषदादि धर्मग्रंथांचें सटीक वाचन सुरू करा. अशा रीतीने आत्मशिक्षण आणि परसेवा ही एकत्र चालूद्या. तुह्मीं काम करण्यास सुरुवात केली ह्मणजे सर्व सुरळीत चालू लागेल. --बद्दल ह्मणशील तर तो लवकर विकारवश होतो. तूं शांतवृत्तीचा आहेस, यासाठी तुझी दोघे एकत्र काम करा. कांही करावयाचे असले तर ते मनापासून करावयाचे अशी वृत्ति सदोदित असावी.
{{gap}}कोणत्याहि व्यक्तीला काय अथवा राष्ट्राला काय, आपली उन्नति व्हावी असें वाटत असेल, तर त्याने स्वतःच कंबर बांधून उद्योगास लागले पाहिजे. खऱ्या हिंदुधर्माचे पुनरुज्जीवन करण्याकरितां अमेरिकेंतून पैशाची अपेक्षा करणे ह्मणजे मृगजळानें तहान भागविण्यासारखेच आहे.
{{gap}}मद्राससारख्या एखाद्या शहरी तुम्ही आपला मुख्य मठ करा. असा मध्यवर्ती मठ असणे कोणत्याहि कार्यास फार अनुकूल असते. अशा मध्यबिंदूपासून उत्साहवर्धक ज्ञानकिरण सर्वत्र पसरूं द्या. आरंभ अगदी लहानशा प्रमाणावर असला तरी हरकत नाही. प्रथम अगदी थोडी माणसें असली तरी एकवेळ कार्यास आरंभ केला ह्मणजे तुमच्या कार्यास आपले आयुष्य वाहणारे दुसरे अनेक मिळतील. अशा कार्यात प्रमुखत्वानें काम करणाऱ्या व्यक्तीने एक गोष्ट मात्र सतत लक्ष्यांत बाळगिली पाहिजे. ती ही की, दुसऱ्यावर अंमल गाजविण्यासारखी कोणतीहि गोष्ट त्याने करूं नये. आपण प्रमुख असलो तरी इतरांसारखेच एक सामान्य मनुष्य आहो असे इतरांस वाटण्यासारखें त्याने आपले वर्तन ठेविलें पाहिजे. ज्याला परसेवेचे तत्व उत्तम रीतीनें अवगत झाले आहे, तोच मनुष्य<noinclude></noinclude>
mo0261j5j8rgchvyzqgjf8gsk959los
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/281
104
63551
229800
160594
2026-05-06T16:00:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229800
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>खरोखर एखाद्या सार्वजनिक संस्थेचा प्रमुख होण्यास लायक असतो. जिवावर बेतले तरी आत्मविश्वास- श्रद्धा- सोडूं नको. आपणास पैशासाठी अथवा मोठेपणाच्या कीर्तीसाठी काम करावयाचें नाहीं. मद्रासमध्येच काही पैसा या कार्यासाठी मिळविण्याची खटपट करा. तुमची वृत्ति खरोखर 'वसुधैव कुटुंबकम् ' अशी झाली, ह्मणजे यश हे ठेवलेलेच.
{{gap}}आपल्या कार्यपूर्तीसाठी धडाडून पेटलेल्या आगीत उडी घालण्याची वेळ आली तरी पाऊलहि मागे घेणार नाही, अशी माणसे मला हवी आहेत. सध्या कामास सुरुवात करा. तात्विक वादविवाद करण्यास पुढे पुष्कळ वेळ मिळेल. अंतःकरणाचें पावित्र्य, धीरवृत्ति आणि दृढनिश्चय एवढ्या भांडवलावर उद्योगास सुरुवात करा.
{{gap}}मी हिंदुधर्मासंबंधी सध्या कांहीं पुस्तक लिहीत नाही. धर्मसंबंधी सुचणारे काही विचार नुसते टांचून ठेवण्याचे काम मी सध्या करीत आहे. हे विचार पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावे की काय, याबद्दल माझा निश्चित असा कांहींच बेत नाही. कवडीमोल असे भाराभर ग्रंथ जगांत अगोदरच नाहीत काय? त्यांत आणखी एकाची भर कशाला हवी? धर्मप्रसारासाठी एखादें मासिक सुरू केले तर त्याने अधिक चांगले कार्य होईल. त्यांत नेहमी निश्चयात्मक पद्धतीने लिहीत जा. तुमच्या लेखावरून प्रतिपाद्य विषयाचा निश्चित बोध झाला पाहिजे. तसेंच दुसऱ्यावर टीका करण्याच्या फंदात पडूं नये हे चांगले. जे कांहीं तुला जनांस सांगावें असें वाटेल, तें सांगून मोकळा हो. तें लोकांस पटते की नाही वगैरे विचार करण्याच्या भानगडींत तूं पडूं नको.
{{gap}}वर्तमानपत्रांतले उतारे यापुढे मला तूं पाठवीत जाऊ नको. त्यांतील निंदास्तुतीकडे लक्ष्य न पुरविण्याचा मी निश्चय केला आहे. येथेंहि निंदाप्रचुर लेखास उत्तर न देण्याचा माझा निश्चय आहे. माझ्या कार्याची त्यामुळे हानी होणार नाही हे मला पक्के ठाऊक आहे.
{{gap}}जर तुह्मी खरोखर माझी मुले असाल तर आतां पाउलभरहि मागे न येता कामास सुरुवात करा. सिंह जसा निधड्या छातीने शत्रूवर तुटून पडतो तसल्याच छातीने तुह्मीं कार्यास लागले पाहिजे. हिंदुस्थानांतच काय, पण साऱ्या जगांत आपणांस जागृति उत्पन्न करावयाची आहे. आतां तुह्मांस कार्यास लागलेच पाहिजे. नकाराची भाषाहि आतां यापढें बोलू नको. देहपातापर्यंत गुरूचा हुकूम पाळणे, हीच खरी गुरुभक्ति. ती तुमच्या अंगी आहे काय? तुमच्या अंगी ती आहे असे मला मनापासून वाटते. तर आतां उठा, आणि माझा विश्वास<noinclude></noinclude>
cozlqjskyt136kkhb1q9n77wdpyx9mh
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/282
104
63552
229801
160595
2026-05-06T16:11:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229801
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२५७ }}
{{rule}}</noinclude>अनाठायीं नव्हता असे सिद्ध करून दाखवा. तुमच्या प्रत्येक पावलाबरोबर मी चालत आहे हे ध्यानांत धरा. तुह्मी कोठेही असलां आणि कांहींहि करीत असलां तरी माझी दृष्टि तुमच्यावर आहे. प्रत्येकाशी शांतवृत्तीने वागत जा.
{{gap}}हिंदुस्थानांत इतक्यांतच परत येण्याचा माझा बेत नाही. येथे होत असलेल्या धर्मजागृतीस काही तरी चिरस्थायित्व यावे अशा दृष्टीने मी सध्या येथे काम करीत आहे. अमेरिकन लोकांचा माझ्यावर दिवसेंदिवस अधिक विश्वास बसत आहे. साऱ्या जगांत जागृति उत्पन्न करण्याची महत्वाकांक्षा बाळगणारांनी आपली दृष्टि जगद्व्यापी केली पाहिजे. तसेच आपल्या इच्छा व आशा बारिकसारीक गोष्टींत गुंतून न राहतां साऱ्या जगाच्या हिताचा विचार करितील इतक्या उदार केल्या पाहिजेत. संस्कृताचा अभ्यास सुरू असूं दे. विशेषतः वेदांतावरील प्रमुख तीन आचार्यांच्या भाष्यांचा तरी अभ्यास उत्तम केला पाहिजे. आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी अनेक मी विचार करीत आहे. यासाठी आतां तुह्मींही कंबर बांधून तयारी केली पाहिजे. माझ्या मुला, व्याख्याता होण्याची तुझी इच्छा असली तर त्या कलेचा विशेष अभ्यास करून लोकचित्ताकर्षक असा वक्ता तुला बनले पाहिजे. तूं कोणतीहि गोष्ट पक्क्या आत्मश्रद्धेनें व भक्तीने केलीस तर त्यांत अवघड असें कांहींच नाही, हे तुझ्या प्रत्ययास येईल. सर्वांना माझें हेच सांगणे आहे. माझे सर्वच गुरुबंधु असे श्रद्धावान् आहेत की, त्यांचे कार्य पाहून सारे जग थक्क होईल, अशी कृति करण्यास ते कधीहि मागे घेणार नाहीत अशी माझी खात्री आहे.
{{gap}}तुह्मीं आरंभ चांगल्या रीतीने केला आहे. आतां एखाद्या अडचणीने हताश न होतां व आत्मविश्वास ढळू न देतां अखंड कार्यव्यापृत राहणे, हेच तुमचे काम आहे. तें तुह्मीं केलेंत ह्मणजे त्याची सुंदर फळे दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर तुमच्या नजरेस येतील.
{{gap}}कोणत्याहि गोष्टीविषयी लोकांबरोबर वादविवाद करण्याच्या भरीस पडूं नका. अशा रीतीने अकारण शत्रु उत्पन्न करण्यांत फायदा नाही. अमकातमका ख्रिस्ती झाला ह्मणून वाद उपस्थित करून रणे माजवावी यांत अर्थ काय? असल्या वादाच्या फंदांत आपण पडूं नये. परधर्मसहिष्णुता हा आह्मा हिंदूंचा जातिस्वभाव आहे. तो सदोदित अंगी बाळगून शांतवृत्तीने आणि चिकाटीने काम केलें ह्मणजे यश शेवटी येणारच येणार.
{{right|आपला,
'''विवेकानंद .'''}}
{{rule|5em}}{{nop}}<noinclude>
{{gap}}स्वा. वि. १७</noinclude>
r59znf1t6e7rs3mffy8cvma0f13258z
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/283
104
63553
229802
160641
2026-05-06T16:23:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229802
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{center|'''पत्र ८ वै.'''}}
{{right|शिकागो, ता. ३ जानेवारी १८९५.}}
प्रियमित्र-यांस.

{{gap}}मी तुह्मांस पत्र लिहावयास बसलों तेव्हां तुमची आठवण होऊन प्रेम आणि कृतज्ञता यांनी माझें हृदय भरून आले. धर्मतत्वांविषयी ज्यांची श्रद्धा कांहीं तरी पक्की झाली आहे, अशांपैकींच तुह्मी आहां, याबद्दल माझी खात्री झाली आहे. श्रद्धा, प्रेम इत्यादि अंतःकरणाचे सात्विक गुण आणि तत्वज्ञान यांच्या संयोगाचा सुंदर परिपाक तुमच्या ठिकाणी झाला आहे. विशेषतः धर्मतत्वांना कृतीत मूर्तस्वरूप कसे द्यावें याची हातोटी तुह्मास चांगली साधली आहे. जें कांहीं करावयाचें तें शुद्ध अंतःकरणाने व श्रद्धेने करावयाचे अशी तुमची वृत्ति असल्यामुळे माझें हृदय तुमच्यापाशी आज उघडे करावे असे मला वाटते.
{{gap}}हिंदुस्थानांत धर्मजागृति थोड्याबहुत प्रमाणावर सुरू झाली आहे; परंतु ती आतां येथेच थांबतां उपयोगी नाही. आतां यापुढे तिचे प्रमाण वाढतें राहील, अशा प्रकारचे उद्योग आपण सुरू केले पाहिजेत. बरेच दिवस विचार करून माझें जें कांहीं मत झाले आहे, तें मी आपणास कळवितो. धर्मसंबंधी शिक्षण देणारे एखादें कॉलेज मद्रासेंत स्थापून त्याचे कार्यक्षेत्र हळू हळू वाढवावें. हिंदुस्थानांतील तरुण पिढीस वेदांतधर्माचे तात्विक ज्ञान उत्तम रीतीने मिळण्याकरितां प्रस्थानत्रयी आणि तीवरील प्रमुख आचार्यांची भाष्ये यांचा सांगोपांग अभ्यास तरुणांकडून करविला पाहिजे. तसेंच जगांतील इतर धर्म आणि तत्वज्ञान यांचा अभ्यासहि त्याबरोबरच चालू ठेवणे श्रेयस्कर होईल. अशा प्रकारच्या कॉलेजामार्फत तत्वज्ञानविवेचक असे एखादें पत्र अथवा मासिक पुस्तकहि सुरू केल्यास चांगले. अशा प्रयत्नाचा आरंभ अगदी लहान प्रमाणावर झाला तरी त्यापासून पुढे मोठी कार्ये खचित निर्माण होतील. आमचे प्राचीन तत्वज्ञान आणि सध्याची पाश्चात्य जागृति यांचे प्रमाणबद्ध मिश्रण सध्या मद्रासेंत दृष्टोत्पत्तीस येऊ लागले आहे.
{{gap}}आमची सध्याची समाजरचना आमूलाग्र बदलली पाहिजे, हे सध्याच्या सुशिक्षितांचे मत मलाहि ग्राह्य वाटते. परंतु हे करावयाचें कसें? या दृष्टीने सुधारकांनी 'मूले कुठारः' ह्मणून जे मोडतोडीचे प्रयत्न केले ते सपशेल फसले आहेत. समाजरचना नियमबद्ध करण्याकरितां ज्या काही गोष्टी आह्मीं पूर्वी केल्या त्या वाईट आहेत असे मला मुळीच वाटत नाही. आमची समाजरचना<noinclude></noinclude>
0vihvc65ek2owrar071ccuizkvkbf4x
229840
229802
2026-05-07T10:28:20Z
कल्पनाशक्ती
3813
229840
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{center|'''पत्र ८ वे.'''}}
{{right|शिकागो, ता. ३ जानेवारी १८९५.}}
प्रियमित्र-यांस.

{{gap}}मी तुह्मांस पत्र लिहावयास बसलों तेव्हां तुमची आठवण होऊन प्रेम आणि कृतज्ञता यांनी माझें हृदय भरून आले. धर्मतत्वांविषयी ज्यांची श्रद्धा कांहीं तरी पक्की झाली आहे, अशांपैकींच तुह्मी आहां, याबद्दल माझी खात्री झाली आहे. श्रद्धा, प्रेम इत्यादि अंतःकरणाचे सात्विक गुण आणि तत्वज्ञान यांच्या संयोगाचा सुंदर परिपाक तुमच्या ठिकाणी झाला आहे. विशेषतः धर्मतत्वांना कृतीत मूर्तस्वरूप कसे द्यावें याची हातोटी तुह्मास चांगली साधली आहे. जें कांहीं करावयाचें तें शुद्ध अंतःकरणाने व श्रद्धेने करावयाचे अशी तुमची वृत्ति असल्यामुळे माझें हृदय तुमच्यापाशी आज उघडे करावे असे मला वाटते.
{{gap}}हिंदुस्थानांत धर्मजागृति थोड्याबहुत प्रमाणावर सुरू झाली आहे; परंतु ती आतां येथेच थांबतां उपयोगी नाही. आतां यापुढे तिचे प्रमाण वाढतें राहील, अशा प्रकारचे उद्योग आपण सुरू केले पाहिजेत. बरेच दिवस विचार करून माझें जें कांहीं मत झाले आहे, तें मी आपणास कळवितो. धर्मसंबंधी शिक्षण देणारे एखादें कॉलेज मद्रासेंत स्थापून त्याचे कार्यक्षेत्र हळू हळू वाढवावें. हिंदुस्थानांतील तरुण पिढीस वेदांतधर्माचे तात्विक ज्ञान उत्तम रीतीने मिळण्याकरितां प्रस्थानत्रयी आणि तीवरील प्रमुख आचार्यांची भाष्ये यांचा सांगोपांग अभ्यास तरुणांकडून करविला पाहिजे. तसेंच जगांतील इतर धर्म आणि तत्वज्ञान यांचा अभ्यासहि त्याबरोबरच चालू ठेवणे श्रेयस्कर होईल. अशा प्रकारच्या कॉलेजामार्फत तत्वज्ञानविवेचक असे एखादें पत्र अथवा मासिक पुस्तकहि सुरू केल्यास चांगले. अशा प्रयत्नाचा आरंभ अगदी लहान प्रमाणावर झाला तरी त्यापासून पुढे मोठी कार्ये खचित निर्माण होतील. आमचे प्राचीन तत्वज्ञान आणि सध्याची पाश्चात्य जागृति यांचे प्रमाणबद्ध मिश्रण सध्या मद्रासेंत दृष्टोत्पत्तीस येऊ लागले आहे.
{{gap}}आमची सध्याची समाजरचना आमूलाग्र बदलली पाहिजे, हे सध्याच्या सुशिक्षितांचे मत मलाहि ग्राह्य वाटते. परंतु हे करावयाचें कसें? या दृष्टीने सुधारकांनी 'मूले कुठारः' ह्मणून जे मोडतोडीचे प्रयत्न केले ते सपशेल फसले आहेत. समाजरचना नियमबद्ध करण्याकरितां ज्या काही गोष्टी आह्मीं पूर्वी केल्या त्या वाईट आहेत असे मला मुळीच वाटत नाही. आमची समाजरचना<noinclude></noinclude>
mu4vl91mm8ruzeiboakq8c96v9s88tj
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/284
104
63554
229803
160647
2026-05-06T16:26:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229803
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२५९ }}
{{rule}}</noinclude>वाईट तर नाहीच नाही. उलट ती फार चांगली आहे असें माझें मत झाले आहे. ती आहे याहून अधिक चांगली करण्याचाच प्रयत्न आह्मांस आतां करावयाचा आहे. पूर्वीची चूक आतां सुधारावयाची अथवा पूर्वीच्या पातकांचे आतां निरसन करावयाचे असा प्रकार नसून पूर्वी केलेल्या चांगल्या गोष्टींहून अधिक चांगल्या गोष्टी करावयाच्या. पूर्वीचा सत्यमार्ग अधिक उज्ज्वल करावयाचा अशासाठीच आमचे प्रयत्न आहेत. माझ्या देशबांधवांनी पूर्वी काही चुका केल्या असे नसून समाजसंस्कृतीची घटना त्यांनी उत्तम रीतीने केली आहे असें माझें मत मी त्यांस खुल्या दिलाने जाहीर करतो. आतां याहून अधिक चांगली कृति करून दाखवा एवढेच त्यांस माझे सांगणे आहे.
{{gap}}आपण जातिभेदाचेच उदाहरण घेऊ. जाति हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ 'उत्पन्न झालेलें' असा आहे. आतां सृष्टि कशी निर्माण झाली-उत्पत्ति कशी झाली-याचा विचार केला पाहिजे. याबद्दल श्रुति सांगते की ‘एकोऽहं बहुस्याम्।' ह्मणजे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ब्रह्म 'एक-अद्वितीय' होते, तें सृष्टीनंतर अनेकशः झाले. 'एकम्' ही स्थिति सृष्टीच्या पूर्वीची आहे. ब्रह्म अनेकशः विभागले जाणे- विचित्रता दिसू लागणें- ह्मणजेच सृष्टि उत्पन्न होणे. जर ही विचित्रता- विविधता- भेद- नाहीसे झाले तर सृष्टीच नाश पावेल हे उघड आहे.
{{gap}}जोपर्यंत कोणताहि मानवसमूह जिवंत असून उत्क्रमण स्थितीत आहे, तोंपर्यंत त्यांत विविधता- विचित्रता- उत्पन्न व्हावी हे सृष्टिनियमास अनुसरूनच आहे. तोच समूह अशी विविधता- विचित्रता-जातिभेद- निर्माण करण्यास असमर्थ असा दिसू लागला तर तो मृत्पिंड होण्याच्या मार्गास लागला, असें खचित समजावें.
{{gap}}समाजांतील प्रत्येक व्यक्तीस स्वतःच्या निरनिराळ्या परिस्थितीप्रमाणे निरनिराळ्या मार्गाने उत्क्रांत होण्यास अवकाश सांपडावा या हेतूनें जातिभेदाची कल्पना उत्पन्न झाली. यामुळे प्रत्येकास आपल्या प्रकृतीस अनुरूपजातीस अनुसरून- अशी स्वतःची वाढ करण्यास अवकाश सांपडला. या तत्वास अनुसरून चाललेल्या समाजांत जातिभेदाची कल्पना हजारों वर्षे जीवंत राहिली हे युक्तच आहे. श्रुतिस्मृतींचा विचार केला तर निरनिराळ्या जातींत रोटीबेटी व्यवहाराला आडकाठी आहे असे दिसून येत नाही. तर मग भरतभूमीच्या अवनतीस सुरुवात केव्हां व कशी झाली, हा प्रश्न उपस्थित होतो. ज्या वेळेस जातिभेदाची ही मूळ कल्पना लुप्त झाली तेव्हां हिंदुसमाज मृतप्राय होण्याच्या<noinclude></noinclude>
cumsx2gaiq4mdkh416qwmwypiuw2yoq
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/285
104
63555
229841
160648
2026-05-07T10:32:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229841
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>मार्गास लागला. जातिभेद नष्ट झाला तर जग नष्ट होईल असें जें भगवान् श्रीकृष्णांनी म्हटले, त्याचाहि अर्थ हाच आहे.
{{gap}}सांप्रतचा जातिभेद हा खरा जातिभेद नसून खरा जातिभेद उत्पन्न करण्याच्या मार्गात तो एफ मोठा अडथळा होऊन बसला आहे. त्यामुळे खरा जातिभेद उत्पन्न होण्यास ह्मणजे व्यक्तिशः उत्क्रांति होण्यास अडचण पडूं लागली आहे. जातिभेद जन्मजात आहे, ही कल्पना प्रचारांत आली ह्मणजे निरनिराळ्या अनेक व नव्या नव्या जाति उत्पन्न होण्यास अवकाश न सांपडल्यामुळे असा समाज कुजू लागून मरणाच्या पंथास लागतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जातिभेदाच्या या मूळ कल्पनेचा तुह्मीं त्याग केल्यामुळेच सांप्रतच्या अवनत स्थितीस पोहोंचलां आहां. जन्मजात जातिभेदाच्या शृंखलांनी जखडून बांधलेला समाज खरे जातिभेद उत्पन्न होण्याच्या आड नेहमीच येत असतो. हा खरा जातिभेदच नव्हे. खरा जातिभेद- विचित्रता- विविधता- उत्पन्न होण्याच्या मार्गातील हे अडथळे दूर करा, ह्मणजे पुन्हां उत्क्रांतीच्या- उन्नतीच्या मार्गास तुह्मी निःसंशय लागाल. यूरोपांत जेव्हां व्यक्तीच्या मार्गातील अडथळे दूर होऊन ही विविधता अधिक व्यक्त होऊ लागली, तेव्हां यूरोपच्या उदयास आरंभ झाला असें तुह्मांस दिसून येईल. यूरोपापेक्षांहि अमेरिकेंत असा जातिभेद निर्माण होण्यास अधिक अवकाश असल्यामुळे त्यांची उन्नति युरोपियन लोकांपेक्षांहि अधिक झपाट्याने होत आहे.
{{gap}}प्रत्येक मुलाचा अथवा मुलीचा जन्म झाला ह्मणजे ज्योतिषी लोक त्याचे जातक वर्तवून त्याचा वर्ण अथवा जाति ठरवितात. याचाहि वास्तविक अर्थ हाच आहे. त्या विशिष्ट व्यक्तीची वाढ कोणत्या मार्गाने होण्याचा संभव आहे, त्याचा सूक्ष्म देह कशा प्रकारच्या गुणकर्मानी युक्त आहे हेच ते ठरवितात. याचमुळे ब्राह्मणकुलांत उत्पन्न झालेल्या व्यक्तीचा क्षत्रिय अथवा वैश्यवर्ण आहे असें ज्योतिषी सांगतात. मी वर सांगितलेलें जातिभेदाचें तत्व ज्योतिषासहि मान्य आहे असे दिसते. या तत्वास अनुसरून खरी जातिभेद संस्था आपण निर्माण केली, तर आपल्या उन्नतीस आपण नवजीवन दिल्यासारखे होणार आहे.
{{gap}}जातिभेद ह्मणजे व्यक्तीची जन्मजात उच्चनीचता दाखविणारी परिस्थिति नव्हे, अथवा त्यामुळे व्यक्तीला काही जन्मजात असे अधिकार प्राप्त होतात असेंहि नाही. माझ्या देशबांधवांस मला जे काही सांगावयाचे आहे तें हेच की, बाबांनों, हजारों वर्षांच्या गुलामगिरीने तुमची जातिभेदसंस्था नष्ट झाली आहे, तिला<noinclude></noinclude>
ix7lfj0y7xe4uwkfers0eah5q9novjp
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/286
104
63556
229842
160649
2026-05-07T10:37:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229842
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२६१ }}
{{rule}}</noinclude>प्राचीन ऋषींनी दाखविलेल्या मार्गाने नवजीवन द्या. तुमचे पूर्वीचे काही टाकून द्या असें माझें मुळीच सांगणे नसून पूर्वीचा मार्ग पत्करा असें माझें सांगणे आहे. मुसलमानांनी साऱ्या जगभर धुमाकूळ माजविला व त्याची एक लाट आह्मांकडे आली, त्यावेळी आम्हास उत्क्रांत होण्यास- आमची वाढ करण्यास- अवकाशच नव्हता. अधिक चांगलें कसें व्हावं हा तेव्हां प्रश्न नसून जगावें कसें इतकाच विचार तेव्हां कर्तव्य होता. आतां ती परिस्थिति साफ बदलली आहे. तेव्हां आतां पूर्वीच्या मार्गाने चालून एकेक पायरी पुढे गेले पाहिजे. सध्यांच्या धर्ममार्तडांनी आंखून दिलेल्या मार्गाने समाजाचा नाश होणार हे उघड दिसत आहे. तर तो सोडून त्यांच्याहून अधिक वंदनीय व पूज्य अशा ऋषिप्रणीत मार्गाचे अवलंबन आपण पुन्हा करूं या.
{{gap}}सध्या जो आमचा समाज अगदी मोडल्यासारखा व बेडौल दिसत आहे, याचे कारण त्याची इमारत अद्यापि पूर्णपणे बांधली गेली नसून अर्धवट स्थितीत राहिली आहे हे होय. ताजमहालासारखी इमारत बांधिली जात असतां अर्धवट स्थितीत कोणी पाहिली तर तिच्या समग्र, सौंदर्याची कल्पना पाहणाराच्या मनांत कितपतशी उतरेल बरें! तीच इमारत पूर्ण झाली ह्मणजे प्रेक्षकांच्या हृदयास तल्लीन करून सोडणारी होते. तसेच आमच्या समाजाची इमारत सध्याच्या अर्धवट स्थितीतून निघून पूर्णावस्थेस पोहोंचली म्हणजे सर्व भाग आपआपल्या जागी यथोचित बसून एकंदर इमारतीस अपूर्व शोभा प्राप्त होईल. आमच्या समाजाच्या भावी इमारतीचा माझ्या दृष्टीप्रमाणे दिसणारा नकाशा आज मी तुह्मांपुढे मांडिला आहे. हा नकाशा बरोबर आहे अशी माझी स्वतःची खात्री आहे.
{{gap}}प्रत्येक राष्ट्राच्या उन्नतीचे वेगवेगळे मार्ग आंखलेले असतात. भारतीय राष्ट्राच्या उन्नतीचा पाया म्हटला ह्मणजे धर्म हा होय. या पायावर तुह्मी पुढील इमारत रचण्यास आरंभ करा, ह्मणजे ती चिरस्थायी होईल. माझ्या मुख्य हेतूच्या सफलतेसाठी मी आंखलेल्या मार्गापैकी एक तुह्मांस आज सांगितला आहे. माझ्या जन्मभूमीच्या बऱ्यासाठी खटपट करणे माझें कर्तव्य आहे; तरी सांप्रत येथेंहि मला माझें उद्दिष्ट कार्य करावयाचे आहे. विशेषतः हिंदुस्थानांतील माझ्या कार्यासाठी ज्या मदतीची मी अपेक्षा करीत आहे, ती मदत मला फक्त येथेच मिळेल असे वाटते. यासाठी आतां माझ्या कार्यास तेथे तुह्मी सुरुवात करा. मी<noinclude></noinclude>
2spjue4alko1e3hvu0pf0t7yyohmfjy
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/287
104
63557
229843
160650
2026-05-07T10:42:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229843
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>स्वतःला आतां परमेश्वराच्या आधीन केले आहे. तो सांगेल तेथें कार्य करीत रहावयाचे इतकेंच माझें काम.
{{gap}}संपत्तीच्या शोधांत त्रिखंड भटकत असतां, परमेश्वरा, तुजसारखें बिनमोल रत्न मला लाभले. तुझ्यासाठी माझ्या सर्वस्वाचा मी त्याग करितो.
{{gap}}कोठे तरी खरें प्रेमस्थान असावें ह्मणून भटकतां भटकतां अखेर तूं सांपडलास. परमेश्वरा, ''''तूं माउलीहून मायाळ । चंद्राहुनी शीतळ । पाण्याहून पातळ । अससी कल्लोळ प्रेमाचा ॥ आतां दुजी तुज उपमा । काय देऊ पुरुषोत्तमा । ओवाळोनि तुझिया नामा । वरुनि टाकितों ॥'''' माझ्या मित्रा, परमेश्वर सदैव तुला सुखी ठेवो.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र ९ वें.'''}}
{{right|शिकागो,}}
{{right|ता० ११ जानेवारी १८९५.}}
प्रिय---

{{gap}}तुमचे पत्र आतांच मिळाले. जगांतील सर्व धर्मापेक्षां ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याकरितां सर्व धर्माची परिषद भरविण्याची कल्पना अमेरिकेंत निघाली. परंतु तात्विक हिंदुधर्माच्या इमारतीस या सभेमुळे यत्किंचिहि इजा झाली नाही. डॉक्टर बी-अथवा त्याच्याच जातीचे इतर अनुदार मताचे लोक यांजपासून आपण कसल्याच मदतीची अपेक्षा करूं नये हे बरें. परमेश्वराची इच्छा असली तर येथे मला पुष्कळ स्नेही मिळतील; किंबहुना हल्लीहि रोज मिळत आहेत. परमेश्वर त्यांचे बरें करो.
{{gap}}बोस्टन आणि न्यूयॉर्क यांच्या दरम्यान हल्ली माझ्या बऱ्याच फेऱ्या सुरू आहेत. या देशांत ही मोठी प्रसिद्ध शहरे आहेत. यांपैकी बोस्टन हे सरस्वतीचें आणि न्यूयॉर्क जें लक्ष्मीचे निवासस्थान आहे. या दोन्ही ठिकाणी माझें कार्य माझ्या कल्पनेपेक्षांहि अधिक फलद्रूप झाले आहे. वर्तमानपत्रे माझ्याबद्दल काय ह्मणतात इकडे मी लक्ष्य देत नाही. यासाठी वर्तमानपत्रांतील उतारे तुह्मांस पाठविण्याचे माझ्याने होणार नाही.{{nop}}<noinclude></noinclude>
kwatkbudgwvxk1wamfikrcu97v69rma
229844
229843
2026-05-07T10:43:16Z
कल्पनाशक्ती
3813
229844
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>स्वतःला आतां परमेश्वराच्या आधीन केले आहे. तो सांगेल तेथें कार्य करीत रहावयाचे इतकेंच माझें काम.
{{gap}}संपत्तीच्या शोधांत त्रिखंड भटकत असतां, परमेश्वरा, तुजसारखें बिनमोल रत्न मला लाभले. तुझ्यासाठी माझ्या सर्वस्वाचा मी त्याग करितो.
{{gap}}कोठे तरी खरें प्रेमस्थान असावें ह्मणून भटकतां भटकतां अखेर तूं सांपडलास. परमेश्वरा, ''''तूं माउलीहून मायाळ । चंद्राहुनी शीतळ । पाण्याहून पातळ । अससी कल्लोळ प्रेमाचा ॥ आतां दुजी तुज उपमा । काय देऊ पुरुषोत्तमा । ओवाळोनि तुझिया नामा । वरुनि टाकितों ॥'''' माझ्या मित्रा, परमेश्वर सदैव तुला सुखी ठेवो.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र ९ वें.'''}}
{{right|शिकागो,
ता० ११ जानेवारी १८९५.}}
प्रिय---

{{gap}}तुमचे पत्र आतांच मिळाले. जगांतील सर्व धर्मापेक्षां ख्रिस्ती धर्म श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याकरितां सर्व धर्माची परिषद भरविण्याची कल्पना अमेरिकेंत निघाली. परंतु तात्विक हिंदुधर्माच्या इमारतीस या सभेमुळे यत्किंचिहि इजा झाली नाही. डॉक्टर बी-अथवा त्याच्याच जातीचे इतर अनुदार मताचे लोक यांजपासून आपण कसल्याच मदतीची अपेक्षा करूं नये हे बरें. परमेश्वराची इच्छा असली तर येथे मला पुष्कळ स्नेही मिळतील; किंबहुना हल्लीहि रोज मिळत आहेत. परमेश्वर त्यांचे बरें करो.
{{gap}}बोस्टन आणि न्यूयॉर्क यांच्या दरम्यान हल्ली माझ्या बऱ्याच फेऱ्या सुरू आहेत. या देशांत ही मोठी प्रसिद्ध शहरे आहेत. यांपैकी बोस्टन हे सरस्वतीचें आणि न्यूयॉर्क जें लक्ष्मीचे निवासस्थान आहे. या दोन्ही ठिकाणी माझें कार्य माझ्या कल्पनेपेक्षांहि अधिक फलद्रूप झाले आहे. वर्तमानपत्रे माझ्याबद्दल काय ह्मणतात इकडे मी लक्ष्य देत नाही. यासाठी वर्तमानपत्रांतील उतारे तुह्मांस पाठविण्याचे माझ्याने होणार नाही.{{nop}}<noinclude></noinclude>
27nbo0p5a4mnqzng46qvluqdx1yb6f4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/288
104
63558
229845
160651
2026-05-07T10:48:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229845
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२६३ }}
{{rule}}</noinclude>{{gap}}--यास पत्र लिहून आपल्या कार्याची रूपरेखा त्यास कळविली आहे, ती तुलाहि समजली असेलच. तर आतां तुमच्यांत काय कर्तबगारी आहे ती दिसू द्या. भाटासारखी बडबड आतां पुरे झाली. आतां या पुढे सर्व बडबड कृतींत उतरविली तरच तिचा उपयोग. हिंदु लोकांनी पुष्कळ सभा भरवून मोठी व्याख्याने दिली, आणि कृतीत कांहीं नाहीं अशी स्थिति झाली तर तुमच्या वायफळ बडबडीकडे कोण लक्ष्य देणार! बोलण्याप्रमाणे कृति नसेल तर असला मनुष्य कोणाच्याहि मदतीस पात्र नाही. माझें कार्य ह्मटले ह्मणजे सत्यमार्गांचा उपदेश करणे एवढेच. त्याला हिंदुस्थान काय आणि अमेरिका काय, सारखेच!
{{gap}}माझी अथवा तुझी कोणी निंदा अथवा स्तुति केली तर दोहींकडेहि तूं लक्ष्य देऊ नको. सिंहासारख्या निधड्या छातीने कार्य करीत रहा, ह्मणजे परमेश्वरराचा तुला आशीर्वाद मिळेल. मरेपर्यंत मी माझें कार्य करीत राहीन आणि हा देह पडल्यानंतरहि जगाच्या बऱ्यासाठी मी उद्योग करीन. सत्य आणि सद्गुण स्वतःच असे जड बुडाचे आहेत की, त्यांच्या आधाराने तुला दुसऱ्या कशाच्या मदतीशिवाय आपलें कार्य करितां येईल. त्यांच्या प्रसाराच्या आड कांहीं आलें तर केवळ आपल्या वजनाने त्याचा चक्काचूर उडविण्यास ते समर्थ आहेत.
{{gap}}येथे हजारों लोक माझ्याबद्दल काळजी वाहणारे आहेत, ही गोष्ट तुला ठाऊकच आहे. सर्व वर्तमानपत्रांनी गिल्ला केला तरी त्याचा कांहीं परिणाम होणार नाहीं इतके महत्व येथे मला हळू हळू प्राप्त होत आहे.
{{gap}}जोपर्यंत माझें अंतःकरण पवित्र आहे आणि माझें कार्य सत्यासाठी आहे, तोपर्यंत माझें काडीमात्र नुकसान करण्यास कोणीहि समर्थ नाही. माझें चित्त शुद्ध असेपर्यंत मला कशाचीहि भीति नाही हे विसरूं नको. नुसत्या पुस्तकी ज्ञानाच्या प्रदर्शनाने जनतेवर कधींहि खरें वजन पडत नसते. आपली उच्च तत्वें ज्या मानाने आपल्या रोजच्या वागणुकीत प्रत्यक्ष दिसू लागतात त्या मानाने आपणांबद्दल लोकांचा आदर व पूज्यभाव वाढत जातो. लोहचुंबका शेजारी लोखंड ठेविलें तर ते जसें अपरिहार्यपणे लोहचुंबकाकडे धाव घेते तसेंच उच्च तत्वें ज्याच्या कृतींत मूर्तरूपाने दिसू लागली आहेत, त्याजकडे सामान्य जनतेची मनें आपोआप आकर्षण होत असतात. तर ही तत्वे आपल्या अंगी निदर्शनास येतील अशा उद्योगास लागा. उच्चतत्वांच्या प्रत्यक्ष आचारास सुरुवात करा. तुमच्या नुसत्या वटवटीचा आतां मला मनापासून कंटाळा आला आहे. घटका गेली, पळे गेली, असें करतां करतां काळ आपणास केव्हां गट्ट करील याचा काही नेम<noinclude></noinclude>
p7sf7wi26xruw1faqu1o5akp0jgaf4t
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/289
104
63559
229846
160652
2026-05-07T10:51:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229846
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>आहे काय? मग अत्यंत मोलाचें असें आपले आयुष्य रिकाम्या चकाट्या पिटण्यांत आणि एरंडाची गुऱ्हाळे लावण्यांत कां व्यर्थ घालवावें?
{{gap}}प्रत्येक व्यक्तीला तसेच प्रत्येक राष्ट्राला आपल्या उन्नतीचे मार्ग स्वतःच शोधिले पाहिजेत, हे कितीवेळ तुह्मास सांगावें! मदतीसाठी दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहून काय होणार! येथे अविरत उद्योग करून तुमच्या कार्यासाठी थोडाबहुत पैसा मी पाठवीन; परंतु याहून अधिक मदतीची अपेक्षा तुह्मीं करूं नये. येथून विशेष मदत मिळून आपण आपले कार्य करूं असें तुह्मांस वाटत असेल तर अशा कार्यास हात घालण्यापेक्षां अगोदर त्याचा आरंभच करूं नये हे चांगलें. माझ्यासंबंधी ह्मणाल तर माझ्या कल्पना रुजण्यास हीच भूमि फार योग्य आहे. जे जे कोणी परमेश्वराचे अव्यभिचारी भक्त असतील त्या सर्वांच्या पायाचा मी सेवक आहे. मग ते जातीने हिंदु, ख्रिस्ती अथवा मुसलमान असले तरी मला सारखेच.
{{gap}}अगदी यत्किंचिहि गाजावाजा न करितां काम करीत राहणे, मला पसंत आहे. माझ्या पावलावर पाऊल टाकून माझ्या मागे येण्याची तुमची इच्छा असेल तर शुद्ध अंतःकरणाने, पूर्ण संन्यस्तवृत्तीने आणि अत्यंत विमल आचरणाने तुह्मीं वागले पाहिजे. तुह्मी असे असला तर तुमच्या कार्यास माझा आशीर्वाद सदोदित आहेच. मित्रा, आपल्या कार्याच्या मानाने पाहिले तर आपले आयुष्य इतकें थोडे आहे की, आतां अधिक विचाराला आणि परस्परांची स्तुति करण्यांत फुकट वेळ घालविण्याला आपणाला थोडासाहि अवधि उरला नाही. कार्यसमाप्तीनंतर परस्परांची स्तुति करण्यास वाटेल तेवढा वेळ मिळेल. तर आतां ओंठ शिवून टाकून कार्यास आरंभ करा. अद्यापपर्यंत कायमस्वरूपाचे असें कांहीसुद्धां तुह्मीं केल्याचें दिसत नाही. एखाद्या मध्यवर्ति मठाची स्थापना तुह्मीं केली नाही. एखादें देऊळ अगर दुसरी इमारतहि बांधली नाही. फार काय, पण आपल्या कार्यात खांद्याशी खांदा भिडवून काम करणारा असा एक मित्रसुद्धां तुह्मीं अद्यापि पैदा केला नाही. आतांपर्यंतच्या कामाचा आढावा काढला तर वटवट- बडबड- यावांचून कांहीं सुद्धां अधिक आढळून येत नाही; आणि त्या बडबडीचा इत्यर्थ पाहिला तर 'आह्मी एके काळी मोठे होतो, अनुकरणीय होतो' ही आत्मस्तुति. आपण पूर्वी कसे होतो, हे मला ठाऊक नाही पण सध्या मात्र शुद्ध मृत्पिंड बनलो आहों हे मला ठाऊक आहे. हिंदुस्थानांत पाहिले तर खऱ्या कार्यासाठी आपणास वाहून घेणारांपेक्षां कीर्तीच्या, पदव्यांच्या, अथवा दुसऱ्या असल्याच तिरस्कर-<noinclude></noinclude>
3uoaoubzvd0wjkj5qd3vw19tt1d6hup
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/290
104
63560
229847
160653
2026-05-07T10:55:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229847
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२६५ }}
{{rule}}</noinclude>णीय भावानांच्या आधीन झालेले लोक अधिक आढळतात. असल्या क्षुद्र जीवांसाठी मी तरी कशाला धडपड करावी? धर्माचा झेंडा उभारण्यास वाटेल तें करणारे शेंकडों वीर मला पाहिजेत. ते कोठे तुला आढळतात काय? जा, त्यांची निवासस्थानें शोधून काढून त्यांस बाहेर आण. आतांपर्यंत मला जी काय मोठी आशा तुह्मीं लाविली, ती मोठ्या नांवाची आणि कीर्तीची. नांव आणि कीर्ति! असल्या क्षुद्र गोष्टींचा माझ्यासमोर पुन्हा उच्चार करूं नको. यापेक्षा माझ्या कार्यासाठी हातावर शीर घेणारे शेकडों वीर मला मिळवून देण्याचे वचन द्या. कार्यास आरंभ करा अशी ओरड आणखी किती वेळ मी करूं? छे छे, तुमच्या हृदयास अद्यापि पीळ पडला नाही. माझ्या हृदयांत धडाडून पेटलेल्या आगीच्या ठिणगीचीहि आंच तुह्मांस अद्यापि लागली नाही, हेच खरें. अरेरे! माझ्या स्थितीची तुह्मांस नीटशी कल्पनाहि आली नाही. नाही तर व्यर्थ चकाट्या पिटण्यांत, आळसांत आणि चैनीत तुह्मीं आयुष्य फुकट घालविले नसते. आतां तरी डोळे उघडा. चैन करण्याची ही आपली वेळ आहे काय? उठा; आतां देहाचा होम करून हजारों लोकांची अंतःकरणे भक्तीने आणि प्रेमाने भरून जातील असें कांहीं करून दाखवा. तुमच्या अंतःकरणांत या कार्याची प्रेरणा व्हावी, कार्यपूर्तीची थोडीशी तरी खरी आंच तुह्मांस लागावी आणि याच कार्यक्षेत्रावर तुह्मांस शूरास उचित असें मरण यावें हीच माझी इच्छा आहे.
{{gap}}आपल्या कामाबद्दल गोमाजी कापशे अथवा तिमाजी पितळी दरवाजे काय ह्मणतात याकडे आतां लक्ष्य पुरवू नका असा माझा निरोप माझ्या सर्व मित्रमंडळीस सांगा.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र १० वे.'''}}
{{right|ता. १२ जानेवारी १८९५.}}
प्रिय----,

{{gap}}कीर्तीसाठी आणि लोकांत मोठे नांव करण्यासाठी कोणतेंहि काम करण्याची माझी इच्छा नाही. हे पुन्हां एकवार आणि शेवटचे माझें तुह्मांस सांगणे आहे. जगाच्या कल्याणासाठी माझ्या कल्पनांचा प्रसार मला करावयाचा आहे. तुह्मीं तेथें जे काय आतांपर्यंत केले त्याने माझें नांव तेथें प्रसिद्ध झाले ही गोष्ट<noinclude></noinclude>
ctrp9yobd4t1fr6wffykku56exttrxz
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/291
104
63561
229848
160654
2026-05-07T11:00:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229848
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>खरी; परंतु असल्या गोष्टीकडे लक्ष्य देण्यास आतां मला वेळ कोठे आहे? अशा रीतीने आयुष्य व्यर्थ घालविण्यापेक्षा त्याचे अधिक चीज करण्याची माझी इच्छा आहे. माझ्या कल्पनांचा अधिक प्रसार व्हावा, त्यांना अधिक मूर्तस्वरूप यावे, अशासाठी तुह्मी आजपर्यंत काय काय केलें? या दृष्टीने तुमच्या कामाचा आढावा काढिला तर शून्य, महाशून्य, अति मोठे शून्य हाच निघावयाचा.
{{gap}}परस्पर विश्वास वाढवावा, परस्परांच्या कार्यात मदत करावी आणि कोणीहि थोडेसे चांगले काम केले तर त्याला उत्तेजन द्यावें हे आमच्या लोकांस शिकविणारी एखादी शाळा अवश्य पाहिजे! येथे मी करीत असलेल्या कामाची प्रशंसा करण्यास कलकत्त्याच्या सभेत पांच हजार लोक जमले होते ह्मणतां! वा! फार आनंदाची गोष्ट आहे. परंतु इतक्या लोकांजवळ प्रत्येकी एक एक आणा आपल्या कार्यासाठी मागा ह्मणजे जाग्यावर एक इसम तरी शिल्लक राहील तर शपथ! आपले राष्ट्र अद्यापि लोकांनी हाती धरून चालविण्याच्या वयाचे आहे! तुह्मांला भूक लागली तर वाढलेलें ताट तुमच्यापुढे कोणी ठेवील तर बरें. विशेषतः तुह्मांला कोणी भरवील तर त्याहून बरें, असें वाटण्याच्या स्थितीत सध्यां तुह्मी आहां. असले परावलंबी जीव जगण्यापेक्षां मेलेले बरे!
{{gap}}मागसलेल्या जातींत शिक्षणाचा प्रसार करण्याची कल्पना सध्या मी सोडून दिली आहे. या गोष्टीलाहि पुढे हळू हळू सुरवात करता येईल. सध्या चोहोंकडे जी निराशा व निरुत्साह पसरला आहे, तो नाहीसा करून लोकांत चेतना उत्पन्न करण्याजोगे खंबीर वक्ते हवे आहेत. सर्व धर्माचें तुलनात्मक शिक्षण देण्याकरितां मद्रासेंत एखादें कॉलेज आपणास स्थापिले पाहिजे. हिंदुस्थानांतील निरनिराळ्या तत्वमतांचे तसेंच संस्कृत आणि निरनिराळ्या युरोपियन भाषा यांचे शिक्षण तरुणांस त्या कॉलेजांत दिले पाहिजे. तसेच आपल्या मतांचा प्रसार करण्याकरितां इंग्रजी व देशी भाषेत वर्तमानपत्रे सुरू केली पाहिजेत. जर तुह्मीं यांपैकी काही करून दाखवाल तर खऱ्या कार्यास तुह्मी आरंभ केला असें मी समजेन. आतां बोलण्यापेक्षां कांही करण्याची तयारी प्रत्यक्षपणे तुह्मीं माझ्या नजरेस आणून द्या. यांपैकी काहींच जर तुमच्याने तेथें करवत नसेल, तर माझें नांव सोडून द्या. माझ्या मनाप्रमाणे मी आपले कार्य येथे होईल तेवढे करीन. माझें ह्मणणे ऐकून घेणारे आणि ते त्यांच्या बुद्धीला पटले तर त्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करून दाखविणारे हजारों लोक येथेच आहेत.<noinclude></noinclude>
h2xuxke2vq1pvmnhoi7o3gfb0t4t0h4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/292
104
63562
229849
160655
2026-05-07T11:09:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229849
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२६७ }}
{{rule}}</noinclude>धर्मसिद्धांतांनी आंखून दिलेल्या मार्गाने चालण्याची ज्यांची ज्यांची तयारी आहे ते सर्व माझेच आहेत.
{{gap}}माझें नांव मोठे व्हावें, माझी कीर्ति वाढावी या उद्देशाने तुह्मी काहीच करूं नका. मोठ्या नांवापेक्षा माझ्या कल्पना मूर्तरूपाने पाहण्यांत मला अधिक संतोष होईल. आजपर्यंत पुष्कळांच्या हातून अशीच चूक झाली. लोकांस सन्मार्ग दाखविण्याच्या बुद्धीनें उपदेश करण्यास प्रथम सुरवात करावी. नंतर लोकांत नांव जरा मोठे होऊ लागले ह्मणजे कीर्तीच्या पाठीस लागून तत्वविचार सोडून द्यावा. असेंच आजपर्यंत अनेकांच्या हातून झाले आहे. ह्मणजे धान्य गेले आणि भूस राहिले असे झाले आहे. भगवान् श्रीरामकृष्णांच्या शिष्यांनी असली चूक होऊ देऊ नये. कोणाचेंहि नांव मोठे करण्याकरितां नव्हे, तर त्याच्या मतांचा प्रसार करण्याकरितां खटपट केली पाहिजे.
{{gap}}परमेश्वर आपणांस सुखी ठेवो.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र ११ वे.'''}}
{{right|ता० १७ फेब्रु० १८९५.}}
प्रिय---

{{gap}}देहपात होण्याची वेळ आली तरी आपल्या कार्यक्रमांत व्यत्यय येऊ द्यायचाच नाही असली भगिरथाच्या निश्चयाची माणसे मला हवी आहेत. यश अथवा अपयश हा प्रश्न आपला नाही. आपल्या कार्याचे पर्यवसान वाटेल तें होवो. निश्चयाने कार्य करणे येवढेच आपले काम, असे समजणारी माणसे मला हवीत. तसेंच आपल्या कार्यात सोंगढोंग वगैरे काही उपयोगी नाही. जे काही करावयाचें तें चवाठ्यावर उभे राहून करावयाचे. माझें कार्य अशा रीतीने चाललें तरच करावयाचें; नाहीपेक्षा त्याची कल्पनाच सोडावी हे मला अधिक प्रशस्त वाटते.
{{gap}}सध्याच्या स्थितीत अत्यंत बिकट अशा कामाला आपण हात घातला आहे. आणि जो जो त्याचा परीघ विस्तृत होत जातो, तो तों तें अधिकच कठीण होत जाते.
{{gap}}सध्या मला बरेच दिवस विश्रांति मिळाली तर पाहिजे आहे. तथापि इंग्लंडांत जाणेहि फार लांबणीवर टाकितां येत नाही. असो. धीराधीराने सर्वकाही<noinclude></noinclude>
t8rm0lqgm3pgavwg4h6eqitz6l6cp49
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/293
104
63563
229850
160656
2026-05-07T11:13:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229850
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६८ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>करता येईल. कोणतेंहि मोठे कार्य अडचणीवांचून सिद्धीस जात नाही, असा नियमच आहे. तुझ्या कल्पनेबाहेर आपल्या कार्यास शेवटी यश येईल अशी माझी खात्री आहे. धीर आणि चिकाटी सदोदित जवळ असली म्हणजे आज नाही उद्यां यश हे येणारच.
{{gap}}न्यूयॉर्क शहर हे सर्व बाबतीत अगदी मध्यबिंदूसारखे आहे. कोणत्याहि कल्पनेचा प्रसार तेथे झाला ह्मणजे तेथून ती कोळ्याच्या जाळ्यासारखी सर्वत्र पसरते. माझ्या कल्पना पक्क्या रुजविण्यासाठी येथे मला माझें सर्व बळ खर्चावें लागले. बीज चांगले रुजून त्याची मुळेहि खोल गेली आहेत. आता त्याचा मोठा वृक्ष होणे हे फक्त कालावधीचे काम आहे.
{{gap}}प्राचीन आर्यतत्वज्ञान सोप्या इंग्रजी भाषेत आणणे हे मोठे कठीण काम आहे. पौराणिक ग्रंथांतील दंतकथांची गुंतागुंत सोडविणे आणि नवीन मनुष्यास अगदी भांबावून टाकणारे सिद्धांत साध्या आणि सुलभ भाषेत आणून त्यांच्याद्वारे धर्मास साधे व्यावहारिक स्वरूप देणे हे किती कठीण काम आहे, याची कल्पना, ज्यांनी अशा कार्यास हात घातला असेल त्यांसच येईल. अद्वैतसिद्धांतांतील परोक्षज्ञान प्रत्यक्ष- व्यवहार्य- करता येईल अशा भाषेत समजावून दिले पाहिजे. दंतकथांची गुंतागुंत सोडवून त्यांतील नीतितत्वें सहज रीतीने समजतील आणि ती आचरणांत आणण्याची शक्यता सिद्ध होईल, अशा रीतीने त्या दंतकथांची मांडणी केली पाहिजे. योगमार्ग ह्मणजे सामान्य मनुष्यास अगदी अगम्य, अगदी अव्यवहार्य, किंबहुना त्याज्य अशी जी समजूत झाली आहे, ती बदलून तो व्यवहार्य आहे, कार्यकारण भावांनी बांधिलेलें असें तें शास्त्र आहे, ही गोष्ट साध्या व सोप्या भाषेत सांगितली पाहिजे. एखाद्या लहान मुलासहि समजण्यासारखें स्वरूप या गोष्टींस द्यावयाचे, हीच माझ्या आयुष्याची इतिकर्तव्यता आहे. यांत मला कितपत यश येईल, हे परमेश्वरास ठाऊक. खटपट करीत राहणे इतकेंच आपल्या हातांत आहे. ती आपण करूं. यशापयशाचा विचार आपला नव्हे. आपल्या अत्युच्च कल्पनांस चिकटून राहणे आणि खरें वैराग्य पूर्णपणे अंगी बाणून ब्रह्मानुभव होईपर्यंत मार्गभ्रष्ट न होणे हे मुमुक्षुस सध्याच्या कनक-कामिनीच्या युगांत अत्यंत दुष्कर आहे.
{{gap}}येथे माझ्या कामास चांगले यश येत आहे, ही परमेश्वराची कृपा ह्मणावयाची. ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि त्याच जातीचे येथील इतर लोक यांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला, याबद्दल त्यांसहि फारसा दोषां देत येत नाही. कनक<noinclude></noinclude>
0o2xdsgk7izf7epasbbijlfy36iz2wa
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/294
104
63564
229851
160657
2026-05-07T11:17:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229851
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२६९ }}
{{rule}}</noinclude>आणि कांता यांस अगदी तुच्छ समजणारा मनुष्य येथे त्यांच्या पाहण्यांत कोणीच आला नव्हता. तेव्हां मी ढोंगी आहे, अशी त्यांची सहजच कल्पना झाली. पावित्र्य आणि ब्रह्मचर्य यांजबद्दल हिंदूंच्याप्रमाणेच पाश्चात्त्यांच्या कल्पना आहेत असें तुह्मी समजू नका. या गुणांस प्रथमस्थान देण्याऐवजी त्यांच्या जागी सद्गुण आणि धैर्य यांची त्यांनी स्थापना केली आहे. आतां येथे बरेच अनुयायी मला मिळत आहेत. कनक आणि कांता यांच्या सपाट्यांत न सांपडतां राहतां येणे शक्य आहे, अशी त्यांची खात्री होऊं लागून या गुणांबद्दल पूज्यभावहि त्यांजमध्ये हळू हळू उत्पन्न होऊ लागला आहे. धीराने आणि निश्चयाने आपले काम करीत राहिले ह्मणजे यश केव्हां तरी येतेच. परमेश्वर सदैव आपणांस सुखी ठेवो.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र १२ वें.'''}}
{{right|न्यूयार्क-९५.}}
प्रिय---

{{gap}}सामाजिक सुधारणा या नांवाने चालू असणाऱ्या चळवळींत केव्हांहि न पडण्याची तुह्मी खबरदारी घ्या. धर्मतत्वांचा प्रसार होऊन त्यांतील तत्वें मनांत पक्की बाणून ती रोजच्या व्यवहारांत प्रत्यक्ष दिसू लागल्याशिवाय कोणतीहि सुधारणा शक्य नाही हे विसरू नका. लोकांच्या चालीरीति, धर्मभोळेपणा इत्यादि गोष्टींचा उल्लेख करून त्यांजवर टीका करीत बसण्याचे आपले काम नव्हे. धार्मिक जीवन आणि परमेश्वरी मार्ग यांची ओळख लोकांस करून देणे हे आपले काम आहे. हे करीत असतां आपले सद्गुरु आणि परमेश्वर यांजवरील विश्वास यत्किंचितहि ढळू देतां उपयोगी नाही. हा विश्वास दृढ बाळगून धैर्याने काम करीत राहिले म्हणजे तुमच्या केसासहि धक्का लावण्याची कोणाची छाती नाही. माझा उत्साह आणि सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत्या प्रमाणावर आहे. माझ्या शूर मुलांनो, आतां कामास आरंभ करा.

{{right|तुमचा स्नेही,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
35ilxci1byylujb2zf7bin36uglc9nt
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/295
104
63565
229852
160663
2026-05-07T11:26:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229852
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७० |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{center|'''पत्र १३ वे.'''}}
प्रिय---

{{gap}}रोजच्या वागणुकीत धर्माचा काही संबंध येतो याची कल्पनाहि अमेरिकन लोकांना नाही. या बाबतींत हिंदूंना अधिक ज्ञान आहे. पैसा कसा मिळवावा याचे ज्ञान अमेरिकन लोकांस अधिक आहे. यासाठी येथे पाया पक्का करणे हेच मोठे कठिण काम आहे; आणि हे केल्याशिवाय मला येथून हालतां येत नाही. कोणतेंहि काम झाले तरी तें पायाशुद्ध आणि पक्के करावें.
{{gap}}भगवान् श्रीरामकृष्ण असे होते आणि तसे होते हे लोकांस सांगण्यापासून कांहीं फायदा नाही. त्यांच्या धर्मज्ञानाचा परिचय लोकांस करून दिला तर त्याचा उपयोग अधिक होईल. बाकी जगाची दृष्टि पाहिली तर एखाद्या सद्गुरूच्या तत्वज्ञानापेक्षा त्याने काय काय चमत्कार केले आणि तो कसा राहत होता इत्यादि किरकोळ गोष्टींची त्यांस अधिक आवड असते.
{{gap}}मोठमोठ्या गोष्टी करण्याबद्दल नुसते बेत करीत बसण्यापेक्षा एखाद्या क्षुल्लक गोष्टीसही एकदम आरंभ करणे अधिक श्रेयस्कर आहे. लहानसहान गोष्टींतहि अनेक अनुभव येऊन आत्मविश्वास वाढतो. यासाठी मोठमोठे बेत करीत न बसतां लहानसहान गोष्टी करण्यास एकदम आरंभ करावा. सदोदित उद्योगरत राहिले ह्मणजे पुढील मार्ग आपोआप दिसू लागतो. कसलाहि गाजावाजा न करितां शांत पण अविरत उद्योग चालू द्या. रोम शहर एका दिवसांत बांधले गेले नाही अशा अर्थाची इंग्रजीत ह्मण आहे तिचा अर्थ हाच आहे.
{{gap}}ह्मैसूरचे महाराजांस देवाज्ञा झाल्याचे कळले. त्यांच्या मृत्यूने आपला एक आधारस्तंभच नाहीसा झाला आहे. असो. परमेश्वराची मर्जी! आपल्या मदतीसाठी त्याने दुसऱ्या कोणाची योजना केली असेल!
{{gap}}मिळाल्यास काही दर्भासनें जरूर पाठवावी.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
ah28gzzx6psemgrq9jqawvfiwa6w7mv
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/296
104
63566
229853
160664
2026-05-07T11:32:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229853
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२७१ }}
{{rule}}</noinclude>{{center|'''पत्र १४ वे.'''}}
प्रिय---

{{gap}}आपलें पत्र आतांच मिळाले. माझ्या कार्यात व्यत्यय आणण्याचा येथे कोणी प्रयत्न केला, तर त्यांत त्यास यश येईल अशी भीति तुह्मी यत्किचिहि बाळगू नका. माझें रक्षण परमेश्वर करीत आहे, तोपर्यंत माझें कोणाच्यानेहि कांहीं वांकडे होणार नाही.
{{gap}}अमेरिका देशाबद्दल आपणास नीटशी कल्पना करता येणार नाही. हा देश विस्ताराने बराच मोठा आहे. येथील लोकांपैकी बराचसा भाग धर्माविषयी फारशी काळजी न करणारा असा आहे. आपणास ख्रिस्तानुयायी ह्मणविणे हा एक देशाभिमानाचा भाग समजला जात असल्यामुळेच ख्रिस्ती धर्म अद्यापि येथे जीव धरून आहे. आपण तेथील कार्यास झपाट्याने सुरवात करावी. इकडील काळजी नको. वेदांतसूत्रे आणि त्यांजवरील निरनिराळ्या मतांच्या आचार्यांच्या टीका उपलब्ध असतील तितक्या पाठवाव्या.
{{gap}}मी हिंदुस्थानांत परत येऊन काय करूं? माझा देह मी परमेश्वराच्या चरणी अर्पण केला आहे. त्याचे कार्य जेथें अधिक प्रमाणावर होईल तीच माझी भूमि. हिंदुस्थानांत येऊन माझ्या कल्पनांस मूर्तस्वरूप देता येईल अशी मला आशा नाही. येथें माझें ह्मणणे ऐकून घेणारे आणि तें पटल्यास त्याप्रमाणे वागण्यास तयार होणारे अनेक आहेत. येथून हालण्याविषयी परमेश्वराचा हुकूम होईल तेव्हां मी येथून दुसरीकडे जाईन. तर आतां मजबद्दल अधिक काथ्याकूट करण्यांत वेळ घालवू नका. कार्यास हळू हळू आणि शांततेने आरंभ करा. विद्यार्थ्यांस वेदांत आणि भाष्ये शिकविण्याकरितां एखाद्या मठाची स्थापना शक्य तितक्या लवकर करा. आपण क्षुद्र, आपल्या हातून काय होणार, असल्या दुर्बल विकारांचे वारेंहि आपल्यास कधीं लागू देऊ नका. असल्या हृदयदौर्बल्याने व्यक्तीचे नुकसान तर होतेच, पण ज्या कार्यात तो पडला असेल त्या कार्याचीहि हानि झाल्यावांचून रहात नाही. परमेश्वरावर अत्यंत दृढ- अगदी अढळ- असा विश्वास आणि आपण कोणतेंहि कार्य पार पाडूंच पाहू अशी धमक असेल तरच यश मिळण्याची खात्री.
{{gap}}आपण सदोदित परमेश्वराजवळ आहों, अशी भावना दृढ करून नेहमी आनंदांत राहावें. आपल्या भावनेपासून कधीहि च्युत न होण्याची पक्की खबरदारी<noinclude></noinclude>
p5w75uo1mip2jxo9u8003wim89vfzav
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/297
104
63567
229854
160665
2026-05-07T11:36:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229854
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७२ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>बाळगली ह्मणजे क्षुद्र विचारांनी मन दुर्बल होत नाही. तसेंच 'परोपदेशे पांडित्यं' असें कधींहि होऊ देऊ नये. आपण जगाचे गुरु नसून शिष्य आहों- चाकर आहों, हे सदोदित ध्यानांत धरिले पाहिजे.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र १५ वे.'''}}
{{right|ता० ६ मे १८९५.}}
प्रिय--

{{gap}}आपलें पत्र आणि श्रीरामानुजाचार्यांच्या भाष्याची प्रत आज सकाळीच पावली.
{{gap}}तेथे येऊन हिंदुधर्मावर हल्ला करणारांशी वादविवाद करावा असे मला वाटत नाही. हिंदु लोक जर यासंबंधी स्वतः उदासीन आहेत आणि ते जर खुशाल घोरत पडले आहेत तर ही त्यांची कामगिरी करण्यावांचून माझें काय खोळंबलें आहे? हिंदुस्थानांतील लोकांस आपल्या धर्माचा मोठा अभिमान आहे असें ह्मणतां. मग तीस कोटि लोकांपैकी आपल्या धर्मावर होणाऱ्या हल्ल्यापासून त्याचे संरक्षण करण्यास कोणीच तयार होत नाही हे काय? विशेषतः आपणांस पंडित ह्मणविणाऱ्या व्यक्तींचे हे काम आहे. असे पंडित ह्मणविणारे तेथे शेकड्याने मोजतां येण्याइतके आहेत. हे वाग्युद्ध करण्याचे काम त्यांच्याकडे सोंपवून मला आपले काम करण्यास मोकळा राहू द्या. परक्या लोकांत येऊन आणि हाडांची काडे करून मी येथे काही कार्य करीत आहे. अशा वेळी काही थोडीशी तरी मदत तुह्मीं मला करावयास नको होती काय? पण हिंदुस्थानाने मला काय मदत केली आहे? अरेरे! हिंदुस्थानांतील लोकांइतके देशाभिमान्यशून्य लोक साऱ्या जगांत कोठेहि आढळणार नाहीत.
{{gap}}उत्तम सुशिक्षित आणि खंबीर मनोवृत्तींचे काही थोडे लोक इकडे पाठवून काही वर्षे त्यांना येथे राहतां येईल, अशी तजवीज जर तुह्मीं कराल, तर आपल्या जन्मभूमीची केवढी मोठी सेवा केल्याचे पुण्य तुह्मांस लाभेल! हिंदुस्थानाबद्दल प्रेम आणि आदर येथें उत्पन्न झाला तर केवढे मोठे पाठबळ आपणांस मिळेल याची कल्पना तुह्मांस नाही. हिंदु लोक ह्मणजे अर्धनग्न स्थितींतले रानटी लोक आहेत, आणि मारून मुटकून तुमच्यांत सुधारणा केली पाहिजे, अशीच अद्यापि पाश्चात्यांपैकी पुष्कळांची तुमच्याबद्दल कल्पना आहे. ही कल्पना अगदी चुकीची<noinclude></noinclude>
5hkjirmt5viehfcch2dnstkkesai9kj
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/298
104
63568
229855
160666
2026-05-07T11:39:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229855
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२७३ }}
{{rule}}</noinclude>आहे अशी तुह्मीं प्रत्यक्ष प्रमाणाने त्यांची खात्री करून दिली पाहिजे. इतक्या लांबच्या पल्ल्यावर येऊन माझ्यासारखा एकटा मनुष्य काय काय करूं शकणार आहे? वास्तविक विचार केला तर मी केले इतकेंहि काम करून घेण्याची तुमची किंमत नाही.
{{gap}}आजपर्यंत जे जे हिंदु लोक इकडे आले, त्यांनी त्यांनी हिंदुस्थानाची आणि हिंदुधर्माची निंदाच केली. कीर्तिलाभ आणि द्रव्यलाभ व्हावा इतक्याच उद्देशाने ते येथे आलेले होते. मग हे लाभ कोणाच्या निंदेने होतात अथवा स्तुतीने होतात, हे पाहण्याचे त्यांस कारणच नव्हते. मी येथे द्रव्यासाठी आलों नाही अथवा कीर्तिसाठीहि आलों नाही, हे तुह्मांस ठाऊकच आहे. माझी इच्छा नसतांहि या दोहोंचा येथे मला लाभ झाला. मी हिंदुस्थानास परत येऊन काय करूं? तेथे मला एक तरी मदतगार मिळणार आहे काय? घरदार, बायकापोरें वगैरे सोडून देऊन खऱ्या संन्यस्तवृत्तीने धर्मप्रसाराचे काम करावयास मद्रासेंत कोण कोण तयार आहेत, ते मला एकवार कळवाल तर बरे होईल. माझ्या आजपर्यंतच्या मेहनतीने हिंदुधर्माबद्दल येथील लोकांच्या पूर्वकल्पना साफ बदलून गेल्या आहेत. हिंदुमनुष्यापासून इतके उदात्त धर्मविचार ऐकावयास सांपडतील ही कल्पनासुद्धा त्यांस प्रथम नव्हती. काही झाले तरी माझी पाठ सोडणार नाहीत, अशा शेंकडों बंधूंची येथे मला प्राप्ति झाली आहे. येथे आणखी काही वर्षे मी राहिलो तर माझ्या कल्पना चांगल्याच फलद्रप होतील, असा मला पक्का भरंवसा वाढू लागला आहे. येथे एक विश्वधर्ममंदिर बांधण्याचा बूट निघाला होता, पण त्याचे पुढे काय झालें तें समजले नाही. असो. न्यूयॉर्क शहरांत माझें बस्तान चांगलें जुळले आहे; आणि तें अमेरिकेतील अगदी प्रमुख शहर असल्यामुळे माझा कार्यभाग आतां सुरळीतपणे खचित पार पडेल. माझ्या शिष्यशाखेपैकी कित्येकांस बरोबर घेऊन एका आश्रमांत मी लवकरच जाणार आहे. तेथे त्यांस योग, भक्ति आणि ज्ञान यांजवर व्याख्याने द्यावयाची आहेत. ही माझी मंडळी लवकर तयार होण्याजोगी आहे आणि ती तशी तयार झाली ह्मणजे माझ्या कार्यात माझ्या बरोबरीने काम करण्यास या मंडळीचा मला चांगलाच उपयोग होईल.
{{gap}}आपलें वर्तमानपत्र सुरू करण्यास लागणारा पैसा आणखी सुमारे एक महिन्याने मी पाठवू शकेन. या कामासाठी भिकारड्या हिंदू लोकांच्या दारांत जाऊन तोंड वेंगाडूं नको. परमेश्वराची मजवर कृपा आहे. त्याने मला उत्तम विचार<noinclude>
{{gap}}स्वा, वि. १८</noinclude>
d7hlcgrgs2mbmamiw21u9s6kmnmplw0
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/299
104
63569
229856
160668
2026-05-07T11:46:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229856
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७४ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>शक्ति आणि कोदंड मोडण्यासारखे सामर्थ्यवान् भुजदंड दिले आहेत. मग मी दुसऱ्याच्या मदतीची अपेक्षा कां करूं? माझे सर्व बेत मी एकटाच स्वतःच्या सामर्थ्यावर पार पाडीन.
{{gap}}वेदांतमतापर्यंत हिंदुतत्वज्ञानाच्या एकंदर तीन पायऱ्या आहेत. त्या तीन पायऱ्या ह्मणजे द्वैत, विशिष्टाद्वैत आणि अद्वैत ह्या होत. एकामागून एक असा यांचा क्रम आहे. मनुष्याच्या धार्मिक जीवनाचा आरंभ द्वैतांत आणि पर्यवसान अद्वैतांत होते. द्वैतास आरंभ करून आपल्या शक्तीप्रमाणे एक एक पायरी चढतां चढतां तो शेवटी पूर्ण अद्वैती बनतो. धर्माचें हेंच तात्विक स्वरूप आहे. हीच तत्वे निरनिराळ्या चालीरीतींत प्रत्यक्ष गोचर होऊं लागून सांप्रतचा हिंदुधर्म बनला आहे. मानवी धर्मबुद्धीचा प्रथम द्वैतांत उदय होतो. द्रुतमार्गाचे जे स्वरूप युरोपखंडांत व्यक्त झाले, त्यास ख्रिस्ती धर्म अशी संज्ञा प्राप्त झाली. पौर्वात्य देशांत प्रकटलेलें स्वरूप मुसलमानी धर्म या नावाने ओळखले जाते. अद्वैतांतील शुद्ध योगमार्गाचे स्वरूप ह्मणजे बौद्ध धर्म होय. निवळ धर्म या शब्दाचा अर्थ मी 'वेदांत' असा करतो. भोवतालची परिस्थिति आणि गरजा यांच्या संगाने तो निरनिराळ्या स्वरूपाने प्रगट झाला इतकेंच. शाक्त, शैव इत्यादि निरनिराळे पंथवालेहि वेदांतांतील तत्वांचाच आपल्या मताला व आचाराला आधार घेतात.
{{gap}}तुह्मी जें मासिक पुस्तक सुरू करणार आहां, त्यांत याच धोरणाने एकसारखे लेखामागें लेख तुह्मांस लिहिले पाहिजेत. धर्मतत्वांच्या या तीन निरनिराळ्या पायऱ्या असून त्यांत सर्वत्र एकवाक्यता आहे, ही गोष्ट प्रमुखपणे तुह्मीं लोकाच्या नजरेस आणिली पाहिजे. निरनिराळ्या मतवाल्यांच्या आचारांवर टीका करण्याचे आपले काम नाही. तत्वज्ञानाचे पूर्ण विवरण करून ते लोकांच्या मनांत ठसेल असे करणे हे आपले काम आहे. हे तत्वज्ञान प्रत्यक्ष व्यवहारांत कसे आचरावें, हे ज्याचे त्याने आपआपल्या परिस्थितीप्रमाणे ठरवावें. वर दाखविलेल्या रूपरेखेस अनुसरून मला एक ग्रंथ लिहावयाचा होता, व याचसाठी तिन्ही प्रमुख आचार्यांची भाष्ये मी मागविली होती. सध्या मला फक्त रामानुजाचार्यांचे भाष्य मिळाले आहे. मी काही मोठा पट्टीचा लेखक नाही हे तुह्मांस ठाऊकच आहे. असो.
{{gap}}दारोदार भीक मागत फिरणे माझ्या स्वभावाला आवडत नाही. काही काम नसले तर मी घरी स्वस्थ बसून राहतो. कांहीं काम आपण होऊन चालून आले, तर ते करावयाचे, नाही तर स्वस्थ बसावयाचे, हा माझा नित्यक्रम<noinclude></noinclude>
3oq1r41cj959qzcmolpvh90tejqy9p8
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/300
104
63570
229857
160669
2026-05-07T11:51:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229857
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२७५ }}
{{rule}}</noinclude>आहे. दांभिकपणाने स्वतःचा बडेजाव जर मला वाढवावयाचा असता तर येथे एखादी मोठी धर्मसंस्था अथवा पंथ काढणे मला फारसे अवघड गेले नसतें. हाय! हाय! कनक आणि कांता यांचे साम्राज्य अमेरिकेसारखं दुसऱ्या कोठेहि नसेल. धर्मोपदेशकांचा वर्ग पाहिला तर 'कवडी कवडीमाया जोडी, रुपिया लाख करोड' हेच त्याचे पालुपद. व्यावहारिक लोकांना धनतृष्णा तर अत्यंत आहेच पण कामिनीच्या हव्यासाचीहि त्यांत आणखी भर पडली आहे. इंद्रियजन्य सुखावर लाथ मारून केवळ परमेश्वराचे अव्यभिचारी भक्त मला अशा लोकांतून निर्माण करावयाचे आहेत. हीच माझी येथील कामगिरी आहे. हे कार्य अगदी हळू हळू सिद्ध होणार हे उघडच आहे. तुह्मी आपल्या हिंदुस्थानांतील कामगिरीस सुरुवात करा.
{{gap}}आपण जें वर्तमानपत्र काढणार आहों, त्यांत आपल्या कार्याशी संलग्न नसलेले असे कोणतेहि विषय येऊ न देण्याविषयी तुह्मीं पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी आपल्या कार्याचे भव्य स्वरूप आणि मोठा दर्जा यांचा कधीहि विसर पडूं देऊं नको. कसलेले आणि ओजस्वी अशाच लेखकांचा संग्रह तुह्मीं केला पाहिजे. तसेंच अहंकार पूर्णपणे विसरून अत्यंत सावधगिरीने पण निश्चयाने एक एक पाऊल तुह्मीं पुढे टाकीत राहिले पाहिजे. भीति आणि अश्रद्धा यांस आपल्या हृदयांतून प्रथम हद्दपार करा. आपण मोठाले कार्यभाग खचित उठविणार आहो. लोकांचे पुढारी होण्याची इच्छा बाळगू नका. त्यामुळे मी मोठा आणि इतर माझे अनुयायी असला दुष्ट अहंकार हृदयांत शिरतो. आपण सर्वांचे सेवक- सर्वांचे पट्टेवाले- आहों अशीच आपली भावना सदोदित राहिली पाहिजे. सर्वांनी माझें ऐकिले पाहिजे असा दुरभिमान झाला ह्मणजे त्यामुळे परोत्कर्षासहिष्णुतादि अनेक विकार आपल्या हृदयांत माहेरघर करतात आणि त्यामुळे शेवटी सर्व कार्याचा नाश होतो.
{{gap}}तुह्मीं कार्याचा आरंभ चांगला केला आहे. आतां चिकाटीने एक एक पाऊल तुह्मीं पढें टाकले पाहिजे. आपणास कोणाशीहि शत्रुत्व करावयाचे नसून सर्वत्र मित्रभाव वृद्धिंगत करावयाचा आहे. आपण पुढारी ह्मणून कार्यास आरंभ केला तर एखादें कुत्रेसुद्धा आपल्या मदतीस येणार नाही. यासाठी आपलें कार्य यशस्वी व्हावे असे वाटत असेल तर अहंकार सोडला पाहिजे.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
lkdv2y1jyjge7ygu9ieetkypvw3ccuz
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/301
104
63571
229858
160674
2026-05-07T11:55:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229858
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२७६ |{{x-larger|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.}}|}}
{{rule}}</noinclude>{{center|'''पत्र १६ वें.'''}}
{{right|न्यूयॉर्क, ता. १४ मे ९५.}}
प्रिय--

{{gap}}न्यूयॉर्क येथे आपल्या कार्याचा पाया आतां बहुतेक मजबूत होत आला असून माझ्या पाठीमागें तें चालू ठेवण्यासारखे अनुयायीहि मला बरेच मिळाले आहेत. सध्या येथील वर्तमानपत्रांत येणारे लेख वाचून तुह्मांस माझ्या येथील कार्याच्या स्थितीची खरी कल्पना होणार नाही. मी येथून निघून गेल्यानंतर माझें कार्य सतत चालू राहील अशी व्यवस्था मला करावयाची आहे आणि परमेश्वर कृपा करील तर हे लवकरच घडून येईल, असा भरंवसा मला वाटू लागला आहे. अशा कार्यासाठी खऱ्या मर्दांची जरूर असते. साऱ्या जगांतला पैसा एका ठिकाणी केला तरी शूर माणसांच्या अभावी असली कार्ये कुजत पडतात.
{{gap}}माझ्याबद्दल निरर्थक काळजी करीत बसू नका. मी अयोग्य वेळी येथून बाहेर गेलो तर इतके दिवसांचे माझे श्रम पाण्यांत जातील. असे होऊ देतां उपयोगी नाही.
{{gap}}माझी नाचक्की करण्याकरितां भल्याबुऱ्या वाटेल त्या उपायांची योजना करणारे येथे जरी बरेच लोक आहेत, तरी उलटपक्षी माझ्या जिवास जीव देणारेहि अनेक मित्र मला मिळाले आहेत.
{{gap}}अत्यंत पवित्रता, अत्यंत स्थैर्य आणि अत्यंत सहनशीलता हीच यशाची मुख्य साधने आहेत.

{{right|आपला,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र १७ वें.'''}}
{{right|न्यूयॉर्क, ता० २२ जून १८९५.}}
प्रिय--

{{gap}}मी हिंदुस्थानांत कधीच परत येणार नाही असा तुमचा समज झालेला दिसतो. परंतु तो समज खरा नाही. तिकडे लवकरच परत येऊन माझ्या जन्मभूमीची सेवा करण्याची माझी इच्छा आहे. कोणत्याहि कार्यात अपयश घेऊन मागे फिरणे मला पसंत नाही. येथें जें वृक्षारोपण मी केले आहे, त्याला नुकतीच कोठे पालवी फुटूं लागली आहे. अशा वेळी गुरांढोरांच्या तोंडांपासून त्याचे<noinclude></noinclude>
lv1tgj09n6bz3udda4uie49kn8w7roh
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ (प्रथम खंड).pdf/302
104
63572
229859
160675
2026-05-07T11:58:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
229859
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||{{x-larger|प्रथम खंड.}}|२७७ }}
{{rule}}</noinclude>संरक्षण करणे अवश्य नाही काय? त्याची मुळे जोमदार होऊन गुरेढोरें व सोसाट्याचे वारे यांजपासून स्वतःचे संरक्षण करतां येण्याइतका तो मोठा होईपर्यंत माळ्याची नजर त्याजवर असली पाहिजे.
{{gap}}कोणतेंहि कार्य घाईने बिघडते. ''''सहसा विदधीत न क्रियाम् । अविवेकः परमापदांपदम् ॥'''' हे कविवचन नित्य लक्ष्यांत बाळगून सदैव कार्यमग्न हो. परमेश्वर माझा मार्गदर्शक असतां काय होईल आणि कसे होईल याची काळजी का करूं? सर्व नीट होणारच यांत संशय नाही.

{{right|तुमची सदैव प्रेमवृद्धि इच्छिणारा,
'''विवेकानंद.'''}}
{{rule|5em}}

{{center|'''पत्र १८ वे .'''}}
{{right|ता. १ जुलै १८९५.}}
प्रिय--

{{gap}}पुन्हां एकवार मी तुला सांगून ठेवतों की, या जगांत आपल्या संरक्षणासाठी आपणच कंबर बांधली पाहिजे. तुह्मी असें लहान मुलांसारखें कां करतां? तुमच्या धर्मावर कोणी हल्ला केला, तर त्याचे संरक्षण तुह्मींच केले पाहिजे. माझ्याबद्दल काळजी करण्याचे तुह्मांला कारण नाही. मला येथे शत्रूपेक्षां मित्रच अधिक आहेत. खरें ह्मणशील तर या देशांत खरे ख्रिस्ती असे सुमारे तृतियांश लोक आहेत. त्यांतून मिशनऱ्यांबद्दल प्रेम असलेले असे लोक सुशिक्षितांत तर फारच थोडे आहेत. उलट मिशनरी लोकांनी एखाद्याची निंदा केली तर तेवढ्यामुळेच त्या गोष्टीचे कौतुक करणारे असे लोक येथे पुष्कळ आहेत. मिशनरी लोकांचें वजन येथे (अमेरिकेंत) दिवसेंदिवस कमीच होऊ लागले आहे. ते हिंदुधर्माविरुद्ध बोलतात याचें तुला इतकें वाईट वाटत असेल तर त्यांना जबाब देण्याइतकें सामर्थ्य तुला नाही काय? कोणी रागें भरल्याबरोबर लहान मूल जसें आईकडे रडत जाते, तसेंच तूंहि करावेंस, हे मला योग्य दिसत नाही. इतकी बालबुद्धि असणे हा काही खरोखर सद्गुण नाही.
{{gap}}येथे मला बरेच अनुयायी मिळाले आहेत. आतां याच अनुयायांची सुसंबद्ध रचना करण्याच्या विचारांत मी आहे. एकवेळ अशी रचना झाली ह्मणजे माझ्या पाठीमागेहि माझें कार्य येथे सुरळीत चालेल. इतकी व्यवस्था पक्की झाल्यावर मी<noinclude></noinclude>
6m1q6j8c3pyzu3oeo8g0xiwk1dgpsvy
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/१०
104
110272
229804
2026-05-06T16:54:17Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229804
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>लहानसी मुक्ताई जैसी सणकांडी : नामदेवांची मुक्ताबाईबाबतची
सुरुवातीची प्रतिक्रिया आणि नंतर त्यात झालेला बदल या सगळ्याचा खुलासेवार
उलगडा यात केला आहे. नामदेवांच्या जीवनातील मुक्ताबाईचे महत्त्वपूर्ण स्थान
आणि मुक्ताबाईच्या जीवनातील नामदेवभेटीचा प्रसंग याचे स्थान ह्या गोष्टीचा
खुलासाही येथे केला आहे.
मुक्ताबाई सांगे खूण वटेश्वरा : वटेश्वर हे चांगदेवांचे केवळ उपास्य
दैवत नसून ते चांगदेवांचे पूर्वीचे गुरु असल्याचा अंदाज या प्रकरणामध्ये
अभ्यासांती नोंदविला आहे.
मुक्ताबाई जीवन चांगया दिधले : मुक्ताबाई आणि तिचा शिष्योत्तम
चांगदेव यांच्यातील हृद्य नात्याचे दर्शन या प्रकरणामध्ये घडविले आहे.
गोरक्षनाथांनंतर गहिनीनाथ - निवृत्तिनाथ - मुक्ताबाई अशी परंपरा न सांगता
गोरक्षनाथ - मुक्ताबाई अशी आपली परंपरा चांगदेव का सांगत असावेत याचा
खुलासा या प्रकरणात केला आहे.
मुक्ताबाईबद्दल गौरवपर उद्गार : मुक्ताबाईंच्या समकालीन
संतांपासून ते आजतागायत अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींनी मुक्ताबाईबद्दल
गौरवोद्गार काढले आहेत. ते उद्गार येथे संकलित करण्यात आले आहेत.
यामध्ये जनाबाई, कान्होपात्रा, सेना न्हावी, चोखामेळा आणि इतर अनेकांच्या
उद्गारांचा समावेश आहे.
विभाग तीन : मुक्ताबाईचे समग्र वाङ्मय
सनद दिली स्वतंत्र सद्गुरुराजें: मुक्ताबाईने विचारलेल्या शंकांचे
समाधान ज्ञानेश्वरांनी कसे केले हा सर्व भाग 'श्रीज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईस दिलेल्या
सनदी' मध्ये येतो. त्यातील आशयाचा विस्तृत विचार येथे केला आहे.
मुक्ताबाईच्या आध्यात्मिक वाटचालीचे दर्शन यामधून घडते.
ताटीचे अभंग - ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा प्रेरणास्त्रोत: ताटीचे
अभंग निर्माण होण्यास उपस्थित झालेली परिस्थिती, ज्ञानेश्वरांची अवस्था,
ह्यामधून मुक्ताबाईने केलेला बोध या साऱ्याचा विचार करून ताटीचे अभंग हे
ज्ञानेश्वरीच्या निर्मितीचा प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट प्रतिपादन येथे केले आहे. या
अभंगांचे महत्त्व केवढे अनन्यसाधारण आहे याची कल्पना त्यातून येईल.<noinclude></noinclude>
a614qm5benf5hjc0wk2r8gvou7gp5fy
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/११
104
110273
229805
2026-05-06T16:54:44Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229805
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ज्ञानबोध ग्रंथ एक 'अपूर्व' उपलब्धी : मुक्ताबाईंचा ज्ञानबोध
ग्रंथ ही मुक्ताबाईंची एक खास स्वतंत्र अशी रचना आहे. त्या ग्रंथाचा
परिचयात्मक विचार या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे. निवृत्तिनाथांनी
मुक्ताबाईला मार्गदर्शन करण्यासाठी केलेली विनवणी, तिला विचारलेले प्रश्न
आणि त्याला मुक्ताबाईने दिलेली उत्तरे असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.
मुक्ताबाईचे अभंग : या प्रकरणामध्ये मुक्ताबाईच्या अभंगांचे काही
गटामध्ये वर्गीकरण करून त्या त्या गटानुसार विचार केलेला आहे. मुक्ताबाईच्या
अभंगांची साहित्यिक दृष्टीने वैशिष्ट्येही यामध्ये नोंदविली आहेत. मुक्ताबाईच्या
अभंगांचा आजवर जो विचार होत होता तो प्रकाशित ४२ अभंगांच्या आधारेच
होत होता. मुक्ताबाईच्या समग्र अभंगांचा विचार इथे प्रथमच होत आहे असे येथे
नमूद करावेसे वाटते.
मुक्ताबाईची सार्थ गाथा : मुक्ताबाईंचे सकलसंतगाथेमध्ये आजवर
४२ अभंगच प्रकाशित झालेले आहे. मुक्ताबाईच्या अभंगांचा अर्थ लावण्याचे
काम आजवर मराठी साहित्यामध्ये झालेले नव्हते. तेव्हा ती अडचण जाणवून
मुक्ताबाईच्या अभंगांचा शाब्दिक स्तरावर परंतु त्यातील भावाशी इमान
राखण्याचा प्रयत्न करून अर्थ लावण्याचे काम आपल्यापरीने प्रस्तुत संशोधिकेने
केले आहे.
मुक्ताबाईच्या संकलित अभंगांची गाथा : मुक्ताबाईचे दोनशे ते
अडीचशे अभंग असल्याची नोंद वेगवेगळ्या कोशांमधून करण्यात आली होती.
मात्र प्रचलित अभंगगाथेमध्ये फक्त ४२ अभंगच समाविष्ट केलेले आढळतात.
तेव्हा इतर अभंग जे पूर्वी प्रकाशित झालेले आहेत मात्र विखुरलेल्या स्वरुपात
असल्याने जे अलक्षित राहिले होते त्या सान्या अभंगांचे संकलन करण्याचा
प्रयत्न येथे संशोधिकेने केला आहे. प्रकाशित अभंगांव्यतिरिक्त २०२ अभंग
उपलब्ध होऊ शकले आहेत.
विभाग चार: परिशिष्ट
पूर्वजन्मी मुक्ताईस गोरक्षकृपेचा सौरस : गोरक्षशिष्या मुक्ताबाईं
ही ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाईपेक्षा वेगळी होती आणि गोरक्षशिष्या मुक्ताबाई ही
ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाईचा पूर्वावतार होती असे एक मत ज्येष्ठ संशोधक
१०<noinclude></noinclude>
rttr69nb34i71q92p5x85zxq8tteu7o
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/१२
104
110274
229806
2026-05-06T16:55:05Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229806
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>डॉ. रा. चिं. ढेरे यांनी मांडले होते आणि त्यामुळे मुक्ताबाई एक की दोन
यासंबंधीची मतमतांतरे निर्माण झाली होती. या प्रश्नाचा चिकित्सक विचार या
प्रकरणामध्ये केला आहे. आणि ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई हिलाच गोरक्षनाथांचा
अनुग्रह लाभला होता. तेव्हा या दोघी जणी भिन्न नाहीत असे साधार विवेचन या
प्रकरणामध्ये केले आहे.
लोकसाहित्यातील मुक्ताबाई : लोकमानस मुक्ताबाईकडे कोणत्या
भावनेतून पाहते याचे स्पष्ट प्रतिबिंब लोकसाहित्यामध्ये पडलेले दिसते. त्याचा
संकलनात्मक स्वरूपाचा विचार येथे केला आहे.
या विभागामध्ये पुढे, मुक्ताबाईचा जीवनपट, मुक्ताबाईच्या पदस्पर्शाने
पुनीत झालेल्या ठिकाणांचे नकाशातील स्थान, मुक्ताबाईची कुंडली, अभंगांची
सूची यांचा समावेश केला आहे.
ज्ञानेश्वरांची भगिनी म्हणूनच ज्ञात असलेल्या मुक्ताबाईचे स्वतंत्र
कार्यकर्तृत्व, तिचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व या पुस्तकाच्या निमित्ताने प्रकाशात येईल
असा विश्वास संशोधिकेस वाटतो. मुक्ताबाईच्या अधिकाराची,
तिच्या
योग्यतेची सुस्पष्ट जाण अभ्यासकांना या निमित्ताने होईल असे वाटते.
मुक्ताबाई आणि गोरक्षनाथ यांची भेट हा एकंदरच महाराष्ट्राच्या
आध्यात्मिक इतिहासातील एकमेवाद्वितीय प्रसंग होय. तेव्हा त्याची महत्ता, त्या
भेटीचा इतरांवर झालेला परिणाम याचा विस्तृत विचार या पुस्तकात केला आहे.
किंबहुना, ह्या भेटीतील महत्त्वपूर्णता हाच या पुस्तकाच्या लेखनाचा केंद्रीय
विचार आहे. अभ्यासकांना वेळोवेळी जे प्रश्न पडलेले दिसतात त्याचाही काही
खुलासा या अनुषंगाने येथे आला आहे. मुक्ताबाई आणि गोरक्षनाथ यांच्या
भेटीचा नीट उलगडा झाल्याने, या साऱ्या भावंडांच्या व समकालीनांच्या
संबंधांवर एक वेगळा प्रकाश पडतो. असा प्रयत्न या पुस्तकाद्वारे प्रथमच होत
आहे हे समाधानाने नमूद करावेसे वाटते.

११<noinclude></noinclude>
tlpakbe4ees5b2vac5lezrmwxntmy6v
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/१३
104
110275
229807
2026-05-06T16:55:23Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229807
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>संशोधिकेचे मनोगत
माझ्या पीएच्.डीच्या संशोधनाचा विषय 'मराठी संतसाहित्यातील
नाथप्रतिपादित सोऽहम् साधना' असा असल्यामुळे साहजिकच मराठी संतांच्या
वाङ्मयाचे परिशीलन करावे लागले. ते करत असताना ज्ञानेश्वरांच्या
अभंगगाथेबरोबरच निवृत्ति, सोपान, मुक्ताबाई यांच्या अभंगांची गाथाही
अभ्यासण्याची आवश्यकता निर्माण झाली. या सर्वच वाङ्मयातील भाषा ही
जुन्या वळणाची असल्याने त्यांच्यावरील सार्थ, सटीप विवरणांचा आधार घ्यावा
लागतो. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथ्याचा अर्थ लावण्याचे काम आजवर झालेले
आहे. त्याच्या नवीन, सुधारित आवृत्तीही निघत आहेत. म्हणून त्यांच्या
अभंगांचा अर्थ लावताना फारशी अडचण भासत नाही. परंतु हे सारे करत
असताना इतर तिघा भावंडांच्या गाथ्याचे सार्थ विवरण आजवर झालेले नाही असे
आढळून आले. अनेक ठिकाणी शोध घेऊनही असे विवरण उपलब्ध असल्याचे
संशोधिकेस आढळले नाही.
स्वत:च्या पीएच्.डी.च्या संशोधनासाठी म्हणून मुक्ताबाईच्या
अभंगगाथ्याचा अभ्यास करत असताना, त्या अभंगांचे काही अर्थ आतून
आकलन होत जावेत असा विलक्षण अनुभव आला आणि या अनुभवामुळेच
मुक्ताबाईच्या सर्व अभंगांचा अर्थ लिहून ठेवण्याचे काम करण्याची प्रेरणा मनात
निर्माण झाली. मुक्ताबाईच्या अभंगांचा समीक्षात्मक विचार आजवर झालेला
आहे पण सार्थ विवेचन केलेले आढळत नाही, तेव्हा असे काही काम आपल्या
हातून घडले तर अभ्यासकांच्या दृष्टीने त्याचा निश्चित उपयोग होईल अशा
भावनेने हे कार्य हाती घेतले.
मुक्ताबाई आणि विद्युल्लता यांचे काही घनिष्ट नाते असल्याचे त्यांच्या
चरित्रावरून व वाङ्मयावरून आढळते. ते नाते संशोधिकेस एका वेगळ्या
प्रकाराने प्रतीत झाले ते असे, विद्युल्लता एका क्षणात येते आणि अवघा प्रांत
काबीज करून जाते तसेच काहीसे या लिखाणाबाबत घडले असे येथे म्हणावेसे
वाटते. झाले असे की, स्वतःच्या प्रबंधकार्याचा एक आंशिक भाग म्हणून मी या
विषयाकडे वळले होते. परंतु मुक्ताबाईचे अभंग वाचताना जणू तिने माझे मन,
१२<noinclude></noinclude>
79v91rrrbqalxin1g1ul0w9l8vcuqy3
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/१४
104
110276
229808
2026-05-06T16:55:44Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229808
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>चित्त काबीज करावे असे झाले. मुक्ताबाईच्या अभंगांच्या निमित्ताने तिचे चरित्र,
तिच्याबद्दल समकालीन व्यक्तींनी काढलेले गौरवपूर्ण उद्गार यातून
मुक्ताबाईबद्दल एक विलक्षण ओढ निर्माण झाली. याविषयाने मी इतकी
भारावले गेले की काही काळपर्यंत पीएच्.डी चे संशोधनकार्यही बाजूला पडले.
नामदेवांनी ज्ञानदेव-नामदेव भेटीचा वर्णन केलेला प्रसंग, मुक्ताबाईंची समाधी हे
सारे वाचताना त्यातून काही रहस्यांची उकल होत आहे असे वाटू लागले. या सर्व
संतसाहित्याचा केवळ ऐतिहासिक, बौद्धिक दृष्टीने विचार करणे पुरेसे नाही, ही
गोष्ट त्यांच्याबद्दलच्या आजवर झालेल्या समीक्षेतून उघड होत होती. तेव्हा याही
गोष्टी मांडाव्यात ह्या भूमिकेतून हे लिखाण केले आहे. 'फोडिले भांडार धन्याचा
हा माल । मी तो हमाल भारवाही ॥' हा अनुभवच जणू मला या काळात आला.
मुक्ताबाई- गोरक्षनाथ यांची भेट हा मुक्ताबाईच्या जीवनचरित्रातील एक
अत्यंत निर्णायक असा प्रसंग आहे. हा प्रसंग नीट लक्षात न घेतला गेल्यामुळे
मुक्ताबाई एक की दोन असे काही प्रश्न अभ्यासकांमध्ये निर्माण झाले होते.
गोरक्षशिष्या मुक्ताबाई ही ज्ञानेशभगिनी मुक्ताबाईपेक्षा भिन्न होती असे मतही रूढ
झाले होते. या साऱ्याचा चिकित्सक विचारही या निमित्ताने येथे होत आहे.
मुक्ताबाईसंबंधी सर्व मुद्रित साहित्य अभ्यासत असताना एक महत्त्वपूर्ण
भाग हाती लागला. मुक्ताबाईंच्या अभंगांचा विचार करताना बहुतांश सर्व
अभ्यासक, समीक्षकांनी त्यांच्या उपलब्ध बेचाळिस अभंगांचाच विचार केला
आहे. १९२७ सालच्या 'मुमुक्षू' च्या अंकामध्ये श्री. ल. रा. पांगारकर यांनी
ज्ञानेश्वरादी मंडळीचे अप्रसिद्ध पण नवोपलब्ध अभंग प्रकाशित केले होते. त्याची
फारशी दखल अभ्यासक घेताना दिसत नाहीत. भारत इतिहास संशोधक
मंडळाच्या ग्रंथालयात जीर्ण अवस्थेत उपलब्ध झालेले हे अभंग पुन्हा छापील
स्वरूपात मांडले तर ते सर्वांना सहज उपलब्ध होऊ शकतील आणि त्याची
आयुर्मर्यादाही वाढेल या भावनेने ते सर्व अभंग येथे जसेच्या तसे समाविष्ट करत
आहे.
विविध कोशांमध्ये मुक्ताबाईसंबंधी अशी माहिती दिलेली आढळते की
मुक्ताबाईंचे दोनशे-अडीचशे अभंग आहेत. तेव्हा वरील उपलब्ध अभंगांखेरीज
इतरत्र कोठे हे अभंग आढळतात का तेही शोधण्याचा प्रयत्न केला. अशा
१३<noinclude></noinclude>
tepr7fyxcb2uu1u5uuhzix0cbyshdfv
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/१५
104
110277
229809
2026-05-06T16:56:01Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229809
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>प्रयत्नामध्ये आजवर प्रकाशित झालेले पण विखुरलेले असल्याने दुर्लक्षित राहिलेले
असे अभंगही मिळाले. ते येथे संकलित केले आहेत. त्यामध्ये मुक्ताबाईच्या
'ज्ञानबोध' या ग्रंथाचाही समावेश आहे. मात्र त्या ग्रंथात निवृत्तिनाथांनी जे प्रश्न
मुक्ताबाईसमोर उपस्थित केले आहेत त्याचा समावेश येथे जागेअभावी केला
नाही.
मुक्ताबाईंचे चरित्र हाही या पुस्तकाचा एक महत्त्वपूर्ण असा भाग
म्हणावा लागेल. आजवर मुक्ताबाईचे चरित्र लिहिण्याचे तुरळक प्रयत्न झालेले
आहेत. त्यामध्ये समाजात प्रचलित असलेल्या आख्यायिका, कथा यांचा आधार
घेऊन हे लिखाणकाम झालेले आढळते. मुक्ताबाईच्या योग्यतेचा विचार न करता,
त्या त्या प्रसंगांची तिच्या आयुष्यातील शक्याशक्यता लक्षात न घेता काही प्रसंग
या चरित्रकारांनी रंगवून सांगितले आहेत. त्यामध्ये नग्नस्थितीतील मुक्ताबाईला
चांगदेवांनी पाहणे आणि त्याचा निगुऱ्या म्हणून तिने उल्लेख करणे हा प्रसंग
बहुतेक सर्व चरित्रकारांनी रंगविला आहे याचे सखेद आश्चर्य वाटते. श्यामजी
मरुद्गण आणि महिपती यांनी हा प्रसंग रंगविला असल्याने सर्वांनी तो खरा
असावा असे गृहित धरून लिखाण केले आहे. परंतु स्वत:च्या तर्काच्या
कसोटीवर या प्रसंगाची शक्याशक्यता पडताळून न पाहता सर्वांनी त्याला मान्यता
द्यावी ही गोष्ट खेदजनक वाटते. म्हणून मुक्ताबाईंचे चरित्र तिच्या स्वतःच्या व
तिच्या समकालीनांच्या अभंगांमधूनच कसे उलगडत जाते हे पाहण्याचा एक
वस्तुनिष्ठ प्रयत्न प्रस्तुत संशोधिकेने केला आहे. असा प्रयत्न करणे गरजेचे वाटले
ह्याचे दुसरे कारण असे की, ज्ञानेश्वरांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रकाश
चरित्र झाकोळून जावे असे काहीसे आजवर घडलेले आढळले. पण येथे
मुक्ताबाई एक स्वतंत्र अस्तित्व या भूमिकेतून तिच्या चरित्राचा विचार केला आहे.
मुक्ताबाईच्या चरित्राचा विचार करत असताना, तिच्या सहवासात
आलेल्या इतर व्यक्ती, तिच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे, लोकसाहित्यात
तिचे उमटलेले प्रतिबिंब, मुक्ताबाई आणि तिची जन्मकुंडली यासारख्या अनेक
अंगांनी तिचा वेध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे. मुक्ताबाई ज्या ठिकाणी
वावरल्या त्या ठिकाणांना स्वतः भेट देऊन त्यासंबंधी माहिती मिळविण्याचा
प्रामाणिक प्रयत्न केला आहे, हे येथे नमूद करावेसे वाटते.
१४<noinclude></noinclude>
84azkwatb0upbqm35wfu0nk3eck9jje
229810
229809
2026-05-06T16:56:32Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229810
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>प्रयत्नामध्ये आजवर प्रकाशित झालेले पण विखुरलेले असल्याने दुर्लक्षित राहिलेले असे अभंगही मिळाले. ते येथे संकलित केले आहेत. त्यामध्ये मुक्ताबाईच्या 'ज्ञानबोध' या ग्रंथाचाही समावेश आहे. मात्र त्या ग्रंथात निवृत्तिनाथांनी जे प्रश्न मुक्ताबाईसमोर उपस्थित केले आहेत त्याचा समावेश येथे जागेअभावी केला नाही. मुक्ताबाईंचे चरित्र हाही या पुस्तकाचा एक महत्त्वपूर्ण असा भाग म्हणावा लागेल. आजवर मुक्ताबाईचे चरित्र लिहिण्याचे तुरळक प्रयत्न झालेले आहेत. त्यामध्ये समाजात प्रचलित असलेल्या आख्यायिका, कथा यांचा आधार घेऊन हे लिखाणकाम झालेले आढळते. मुक्ताबाईच्या योग्यतेचा विचार न करता, त्या त्या प्रसंगांची तिच्या आयुष्यातील शक्याशक्यता लक्षात न घेता काही प्रसंग या चरित्रकारांनी रंगवून सांगितले आहेत. त्यामध्ये नग्नस्थितीतील मुक्ताबाईला चांगदेवांनी पाहणे आणि त्याचा निगुऱ्या म्हणून तिने उल्लेख करणे हा प्रसंग बहुतेक सर्व चरित्रकारांनी रंगविला आहे याचे सखेद आश्चर्य वाटते. श्यामजी मरुद्गण आणि महिपती यांनी हा प्रसंग रंगविला असल्याने सर्वांनी तो खरा असावा असे गृहित धरून लिखाण केले आहे. परंतु स्वत: च्या तर्काच्या कसोटीवर या प्रसंगाची शक्याशक्यता पडताळून न पाहता सर्वांनी त्याला मान्यता द्यावी ही गोष्ट खेदजनक वाटते. म्हणून मुक्ताबाईंचे चरित्र तिच्या स्वतःच्या व तिच्या समकालीनांच्या अभंगांमधूनच कसे उलगडत जाते हे पाहण्याचा एक वस्तुनिष्ठ प्रयत्न प्रस्तुत संशोधिकेने केला आहे. असा प्रयत्न करणे गरजेचे वाटले ह्याचे दुसरे कारण असे की, ज्ञानेश्वरांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रकाश चरित्र झाकोळून जावे असे काहीसे आजवर घडलेले आढळले. पण येथे मुक्ताबाई एक स्वतंत्र अस्तित्व या भूमिकेतून तिच्या चरित्राचा विचार केला आहे. मुक्ताबाईच्या चरित्राचा विचार करत असताना, तिच्या सहवासात आलेल्या इतर व्यक्ती, तिच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे, लोकसाहित्यात तिचे उमटलेले प्रतिबिंब, मुक्ताबाई आणि तिची जन्मकुंडली यासारख्या अनेक अंगांनी तिचा वेध घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे. मुक्ताबाई ज्या ठिकाणी वावरल्या त्या ठिकाणांना स्वतः भेट देऊन त्यासंबंधी माहिती मिळविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, हे येथे नमूद करावेसे वाटते. १४<noinclude></noinclude>
4zpf7knlxot1tsyb9a3prgigfddv3jw
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/१६
104
110278
229811
2026-05-06T16:56:50Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229811
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>हे सारे करत असताना ह्या पुस्तकामध्ये काही त्रुटीही राहून गेल्या आहेत
त्याचीही मला जाणीव आहे. सर्व लेखनामध्ये अभंगांचा केलेला वापर हा
वाजवीपेक्षा जास्त आहे, असे वाटण्याचीही शक्यता आहे. परंतु हे करत असताना
त्यामागे भूमिका आहे ती अशी; मुक्ताबाईचा काळ आणि आज आपण ज्या
काळात वावरत आहोत तो काळ यामध्ये फार मोठा कालावधी निघून गेलेला
आहे. तेव्हा आपल्याला आज जर मुक्ताबाईसंबंधी एखादे विधान करावयाचे
झाले तर त्यांच्या अभंगांचा आधार घेऊनच बोलावे लागणार हे उघड आहे. हे
लिखाण शक्य तेवढे वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्थितीला धरून व्हावे या हेतूने
अभंगांचा आधार घेतघेतच हे लिखाण केले आहे. दुसरी त्रुटी म्हणजे यामध्ये
काही ठिकाणी पुनरावृत्तीही झाली आहे. परंतु त्या त्या ठिकाणी तो विचार करणे
प्रकरणांच्या दृष्टीने गरजेचे ठरल्याने तो दोष पत्करूनही ते लिखाण केले आहे.
आणखी एका गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. श्री. का. अ. जोशी
सकलसंतगाथेच्या प्रस्तावनेत म्हणतात, "इतर क्षेत्रात जसे संशोधन झाले आहे
तसे संतवाङ्मयातही झाले आहे व होत आहे. पण सामान्यपणे संशोधकांची दृष्टी
शब्दप्रामाण्यावर असते, त्याप्रमाणे या अभंगांचे संशोधन करण्यातही बहुधा
संशोधक शब्दप्रामाण्यावरच जास्त भर देतात. पण अभंग हे उत्स्फूर्त आलेले
असतात. त्यामुळे नुसत्या शब्दांच्या अर्थावरून केलेले तर्क पुष्कळ वेळा विसंगत
ठरतात. ज्या भावातून अभंग निर्माण झाले त्या भावात जर आपण गेलो तरच त्या
त्या शब्दांचा अर्थ आपल्याला लागेल. खरोखरच ती एक अनुभूती आहे. नुसते
शब्दांचे अर्थ लावून त्यावरून तर्क काढून आपण कोठेही पोहोचू शकणार नाही.
त्या भावात राहून अर्थ लावला आणि त्यावरून तर्क केले तर ते सुसंगत ठरतील.
शाब्दिक कीस काढून काही उपयोग होणार नाही.'

याच मनोभूमिकेशी साधर्म्य राखत हे काम करण्याचा आपल्या परीने पण
प्रामाणिकपणाने प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. असे करत असताना, मुक्ताबाई
ज्या उच्च मनोभूमिकेतून प्रतिपादन करत आहेत तो अर्थ नीट लक्षात न येणे ही
शक्यताही येथे नाकारता येत नाही. मात्र अर्थाचा अनर्थ होणार नाही एवढी
खबरदारी बाळगण्याचा येथे जरूर प्रयत्न केला आहे. मुक्ताबाईंची उच्च स्थिती
समजून घेण्यासाठी तशीच अधिकारी व्यक्ती पाहिजे हे निर्विवाद सत्य पण तरीही
१५<noinclude></noinclude>
npgcozr97exvjmpykwac69qcekctcob
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/१७
104
110279
229812
2026-05-06T16:57:10Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
229812
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>अभ्यासक या नात्याने, त्यामागील भाव जाणून अभंगांचा अर्थ लावण्याचा प्रयास
संशोधिकेने केला आहे. त्याहूनही सरस प्रकारे अर्थ लावण्याचे काम करताना उद्या
एक पाऊलवाट म्हणून हे काम उपयोगी पडले तर या कामाचे निश्चित चीज झाले
असे वाटेल. एवढ्या साध्या भूमिकेने हे लिखाण केले आहे.
उपलब्ध आधाराच्या साहाय्याने शक्य होईल तेवढा जास्तीत जास्त
मुक्ताबाईच्या जीवनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून सत्याचे काही
कवडसे हाती लागल्यासारखे वाटतात. परंतु हे संशोधनही अंतिम नाही याची
जाणीव मला आहे. उद्या अधिक पुरावे समोर आले तर दुसऱ्या एखाद्या
संशोधकास त्या पुराव्यांच्या प्रकाशात सत्याच्या अधिक जवळ जाता येईल,
असेही
घडू
• शकेल. विज्ञानात जसे सातत्याने संशोधन चालूच राहते, तसेच या
क्षेत्रातील संशोधनाबाबतही सत्य आहे असे म्हणावेसे वाटते. आजचे सत्य हे उद्या
खोटेही ठरू शकते कारण नवीन प्रकाशात उपलब्ध पुराव्यांचा काही अधिक
चांगला उलगडा होऊ शकतो.
प्रस्तुत पुस्तकामध्ये अभ्यासांती जे निष्कर्ष संशोधिकेने नोंदविले आहेत
त्याबद्दल इतरांची मते भिन्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु अशा
प्रकारच्या वैचारिक मंधनामधूनच संशोधन अधिक पूर्णत्वाला जाते असा
संशोधिकेचा विश्वास आहे.
अध्यात्मशास्त्राचा आजवर झालेला विकास आणि पुढे अपेक्षित
असलेला विकास यासंबंधीचे शास्त्रीय विवेचन श्रीअरविंदांनी आपल्या
तत्त्वज्ञानात केले आहे. मुक्ताबाईच्या जीवनाचा उलगडा होण्यासाठी मला
पाँडिचेरीच्या श्रीअरविंद आणि मदर यांच्या तत्त्वज्ञानाचा फार उपयोग झाला. त्या
आधाराशिवाय मला मुक्ताबाईच्या आध्यात्मिक जीवनाची उकल होणे केवळ
अशक्य होते हे पुनःपुन्हा जाणवत राहिले.
मुक्ताबाईसंबंधी अजूनही पुष्कळसे संशोधनकार्यं बाकी आहे, हे
सातत्याने जाणवत राहिले. भावी काळात या आजवर उपेक्षित राहिलेल्या
महत्त्वपूर्ण भागाकडे संशोधकांचे लक्ष वळेल अशी आशा वाटते.

१६<noinclude></noinclude>
qb9w2l0k0a079j20ngwgfuqi5jkyicu
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/१८
104
110280
229813
2026-05-06T16:59:39Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ऋणनिर्देश 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं' ह्या ग्रंथाचे काम करीत असताना मला अनेकानेक व्यक्तींचे सहकार्य लाभले. या सर्व कामामध्ये मला प्रामुख्याने मोलाची मदत झाली ती पुण्यात..."
229813
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ऋणनिर्देश
'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं' ह्या ग्रंथाचे काम करीत
असताना मला अनेकानेक व्यक्तींचे सहकार्य लाभले.
या सर्व कामामध्ये मला प्रामुख्याने मोलाची मदत झाली ती पुण्यातील
पुढील ग्रंथालये आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांची : जयकर ग्रंथालय, भांडारकर
इन्स्टिट्यूट, रामकृष्ण मठ, मातृस्मृती, नगर वाचन मंदिर,
महाराष्ट्र साहित्य
परिषद, भारत इतिहास संशोधक मंडळ, गरवारे वाणिज्य महाविद्यालय.
मुक्ताबाईसंबंधी मला आवश्यक असलेली पुस्तके या सर्व ग्रंथालयातून मला
वेळोवेळी उपलब्ध होऊ शकली त्यामुळेच हे संशोधन शक्य झाले.
मुक्ताबाईच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना ज्या ग्रंथावाचून तो अभ्यास
पूर्णच होऊ शकला नसता असा ग्रंथ म्हणजे 'ज्ञानबोध नगर जिल्हा ऐतिहासिक
वस्तु संग्रहालयाचे श्री. सुरेश जोशी व त्यांचे कुटुंबिय यांच्या साहाय्याने मला तो
ग्रंथ प्राप्त झाला.
'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायी' या पुस्तकाचा, मुक्ताबाई
आणि गोरक्षनाथ यांची भेट हा गाभाभूत असा विचार आहे. या भेटीला आधार
म्हणून दाखविता येतील असे अभंग कै. ल. रा. पांगारकर यांना हस्तलिखित
स्वरूपात मिळाले. आणि ते त्यांनी 'मुमुक्षू'च्या १९२७ सालच्या अंकांमध्ये
प्रकाशित केले होते. तेव्हा त्यांच्याविषयीची कृतज्ञताही माझ्या मनात जागी होते.
डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. सुशीला पाटील यांसारख्या अभ्यासक मंडळींनी
मुक्ताबाईसंबंधी जे आजवर लिखाण केले, त्या अभ्यासातून जे अनेक प्रश्न
उपस्थित केले, लोकांसमोर मांडले त्या प्रश्नांमुळेही संशोधिकेच्या अभ्यासाला
एक दिशा मिळाली म्हणून त्यांचाही कृतज्ञतेने उल्लेख या ठिकाणी मला करावासा
वाटतो.
मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो माझे पीएच्. डी. चे मार्गदर्शक
असलेल्या डॉ. अशोक कामत सरांचा. स्वत:ची स्वतंत्र मते मांडण्यासाठी त्यांनी
दिलेले स्वातंत्र्य हे मला विशेष महत्त्वाचे वाटते. या त्यांच्या वृत्तीचे एक
अभ्यासक म्हणून मी निश्चितच स्मरण ठेवले पाहिजे असे मला वाटते.
१७<noinclude></noinclude>
1b24kxxkt8ax84le1ezlamjrebrlh9i
229839
229813
2026-05-06T17:08:03Z
QueerEcofeminist
918
229839
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ऋणनिर्देश 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं' ह्या ग्रंथाचे काम करीत असताना मला अनेकानेक व्यक्तींचे सहकार्य लाभले. या सर्व कामामध्ये मला प्रामुख्याने मोलाची मदत झाली ती पुण्यातील पुढील ग्रंथालये आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांची: जयकर ग्रंथालय, भांडारकर इन्स्टिट्यूट, रामकृष्ण मठ, मातृस्मृती, नगर वाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषद, भारत इतिहास संशोधक मंडळ, गरवारे वाणिज्य महाविद्यालय. मुक्ताबाईसंबंधी मला आवश्यक असलेली पुस्तके या सर्व ग्रंथालयातून मला वेळोवेळी उपलब्ध होऊ शकली त्यामुळेच हे संशोधन शक्य झाले. मुक्ताबाईच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना ज्या ग्रंथावाचून तो अभ्यास पूर्णच होऊ शकला नसता असा ग्रंथ म्हणजे 'ज्ञानबोध नगर जिल्हा ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाचे श्री. सुरेश जोशी व त्यांचे कुटुंबिय यांच्या साहाय्याने मला तो ग्रंथ प्राप्त झाला.
'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायी' या पुस्तकाचा, मुक्ताबाई आणि गोरक्षनाथ यांची भेट हा गाभाभूत असा विचार आहे. या भेटीला आधार म्हणून दाखविता येतील असे अभंग कै. ल. रा. पांगारकर यांना हस्तलिखित स्वरूपात मिळाले. आणि ते त्यांनी 'मुमुक्षू'च्या १९२७ सालच्या अंकांमध्ये प्रकाशित केले होते. तेव्हा त्यांच्याविषयीची कृतज्ञताही माझ्या मनात जागी होते. डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. सुशीला पाटील यांसारख्या अभ्यासक मंडळींनी मुक्ताबाईसंबंधी जे आजवर लिखाण केले, त्या अभ्यासातून जे अनेक प्रश्न उपस्थित केले, लोकांसमोर मांडले त्या प्रश्नांमुळेही संशोधिकेच्या अभ्यासाला एक दिशा मिळाली म्हणून त्यांचाही कृतज्ञतेने उल्लेख या ठिकाणी मला करावासा वाटतो. मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो माझे पीएच्. डी. चे मार्गदर्शक असलेल्या डॉ. अशोक कामत सरांचा. स्वत: ची स्वतंत्र मते मांडण्यासाठी त्यांनी दिलेले स्वातंत्र्य हे मला विशेष महत्त्वाचे वाटते. या त्यांच्या वृत्तीचे एक अभ्यासक म्हणून मी निश्चितच स्मरण ठेवले पाहिजे असे मला वाटते. १७<noinclude></noinclude>
2qy26tz1ns61q9lu91dr12h5aqikto3
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२०
104
110281
229814
2026-05-06T17:00:05Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ऋणनिर्देश 'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं' ह्या ग्रंथाचे काम करीत असताना मला अनेकानेक व्यक्तींचे सहकार्य लाभले. या सर्व कामामध्ये मला प्रामुख्याने मोलाची मदत झाली ती पुण्यात..."
229814
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ऋणनिर्देश
'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं' ह्या ग्रंथाचे काम करीत
असताना मला अनेकानेक व्यक्तींचे सहकार्य लाभले.
या सर्व कामामध्ये मला प्रामुख्याने मोलाची मदत झाली ती पुण्यातील
पुढील ग्रंथालये आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांची : जयकर ग्रंथालय, भांडारकर
इन्स्टिट्यूट, रामकृष्ण मठ, मातृस्मृती, नगर वाचन मंदिर,
महाराष्ट्र साहित्य
परिषद, भारत इतिहास संशोधक मंडळ, गरवारे वाणिज्य महाविद्यालय.
मुक्ताबाईसंबंधी मला आवश्यक असलेली पुस्तके या सर्व ग्रंथालयातून मला
वेळोवेळी उपलब्ध होऊ शकली त्यामुळेच हे संशोधन शक्य झाले.
मुक्ताबाईच्या वाङ्मयाचा अभ्यास करताना ज्या ग्रंथावाचून तो अभ्यास
पूर्णच होऊ शकला नसता असा ग्रंथ म्हणजे 'ज्ञानबोध नगर जिल्हा ऐतिहासिक
वस्तु संग्रहालयाचे श्री. सुरेश जोशी व त्यांचे कुटुंबिय यांच्या साहाय्याने मला तो
ग्रंथ प्राप्त झाला.
'कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायी' या पुस्तकाचा, मुक्ताबाई
आणि गोरक्षनाथ यांची भेट हा गाभाभूत असा विचार आहे. या भेटीला आधार
म्हणून दाखविता येतील असे अभंग कै. ल. रा. पांगारकर यांना हस्तलिखित
स्वरूपात मिळाले. आणि ते त्यांनी 'मुमुक्षू'च्या १९२७ सालच्या अंकांमध्ये
प्रकाशित केले होते. तेव्हा त्यांच्याविषयीची कृतज्ञताही माझ्या मनात जागी होते.
डॉ. रा. चिं. ढेरे, डॉ. सुशीला पाटील यांसारख्या अभ्यासक मंडळींनी
मुक्ताबाईसंबंधी जे आजवर लिखाण केले, त्या अभ्यासातून जे अनेक प्रश्न
उपस्थित केले, लोकांसमोर मांडले त्या प्रश्नांमुळेही संशोधिकेच्या अभ्यासाला
एक दिशा मिळाली म्हणून त्यांचाही कृतज्ञतेने उल्लेख या ठिकाणी मला करावासा
वाटतो.
मला विशेष उल्लेख करावासा वाटतो तो माझे पीएच्. डी. चे मार्गदर्शक
असलेल्या डॉ. अशोक कामत सरांचा. स्वत:ची स्वतंत्र मते मांडण्यासाठी त्यांनी
दिलेले स्वातंत्र्य हे मला विशेष महत्त्वाचे वाटते. या त्यांच्या वृत्तीचे एक
अभ्यासक म्हणून मी निश्चितच स्मरण ठेवले पाहिजे असे मला वाटते.
१७<noinclude></noinclude>
1b24kxxkt8ax84le1ezlamjrebrlh9i
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२१
104
110282
229815
2026-05-06T17:00:34Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मोतियांचा चुरा फेंकिला अंबरी । विजूचिया परी कीळ झालें ॥ जरी पितांबरे नेसविली नभा । चैतन्याचा गाभा नीळबिंदू ॥ तळीपरी परसे शून्याकार झालें । सर्पाचींहि पिलें नाचूं लागे ॥ asasोनी वी..."
229815
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>मोतियांचा चुरा फेंकिला अंबरी । विजूचिया परी कीळ झालें ॥
जरी पितांबरे नेसविली नभा । चैतन्याचा गाभा नीळबिंदू ॥
तळीपरी परसे शून्याकार झालें । सर्पाचींहि पिलें नाचूं लागे ॥
asasोनी वीज निमाली ठायींचे ठायीं । भेटली मुक्ताबाई गोरोबाला ।।
ज्ञानदेव म्हणे कैसी झाली भेट । ओळखिलें अविट आपुलेंपण ||<noinclude></noinclude>
fi180xeih6kz4vsysn8vrk33j8msjuw
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२२
104
110283
229816
2026-05-06T17:00:45Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "चित्कला मुक्ताबाई 'तैसी दशेचि वाट न पाहता । वयसेचिया गावा न जाता । बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ।।' असे ज्यांच्याबद्दल यथार्थपणे म्हणता येते अशी ज्ञानेश्वरादी चार भावंडे. या सर्..."
229816
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>चित्कला मुक्ताबाई
'तैसी दशेचि वाट न पाहता । वयसेचिया गावा न जाता ।
बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ।।'
असे ज्यांच्याबद्दल यथार्थपणे म्हणता येते अशी ज्ञानेश्वरादी चार भावंडे. या
सर्वच भावंडांचे जीवन एका अलौकिक प्रभेने तेजाळलेले दिसते. भौतिकातील
अडीअडचणी, निंदा, उपेक्षा, बहिष्कृत जीवन इ. गोष्टी वाट्याला येऊनही
त्यामुळे विचलित न होता स्वतःच्या आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाटचाल
करणारी ही भावंडे. स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे. आध्यात्मिक
योग्यतेच्या दृष्टीने सममेळ असणारी निवृत्ति, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई ही
भावंडे; परंतु ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्व जनमानसावर इतक्या प्रभावीपणे ठसावले
गेले की इतर तिन्ही भावंडे त्यापुढे काहीशी अलक्षित वाटतात. मुक्ताबाई हे या
भावंडांमधील एक आगळे व्यक्तिमत्व. त्यांच्या चरित्राचा वेध घेण्याचा हा एक
प्रयत्न.
मुक्ताबाईंचा जन्म, त्यांचे जीवन, त्यांची समाधी या सान्या गोष्टी
म्हणजे एक स्वयंभू चमत्कार आहे. अशा या अद्वितीय जीवनाच्या मूळाकडे दृष्टी
टाकली तर त्यांचे अलौकिकत्व कळण्यास थोडी मदत होईल. संन्याशाची मुले
म्हणून लोकजीवनाच्या दृष्टीने ही भावंडे निंदेला पात्र झाली आणि शास्त्राच्या
दृष्टीने ती व्रतबंधाला अपात्र ठरली, तरी या भावंडांच्या पित्याच्या संन्यस्त
वृत्तीतच त्यांचे अलौकिकत्व साठवलेले दिसून येते. त्यांचे वडील विठ्ठलपंत. ते
मूळचे आपेगावचे, वृत्ती संन्यस्त आंतरिक ओढ तपाकडे, घरदार संसार
याबाबत निरासक्त, वेदविधानांचा दांडगा अभ्यास व तीर्थयात्रेची ओढ. अल्प
काळात ते शास्त्रवेत्ते झाले. जवळपास संपूर्ण भारतभर भ्रमण करून
भगवत्चिंतनात आळंदीला येऊन पोहोचले.
तेथे राहणाऱ्या सिद्धोपंतांना त्यांच्या कन्येसाठी वर म्हणून
विठ्ठलपंतांची मूर्ती डोळ्यांत भरली. आग्रहाने सिद्धोपंतांनी त्यांना भोजनास
बोलाविले. त्याच रात्री सिद्धोपंतांना पांडुरंगाचा दृष्टान्त झाला व आपली मुलगी
त्यांना अर्पण करून सालंकृत कन्यादान करण्याचा आदेश मिळाला.
२१<noinclude></noinclude>
dx4iqj55pj6gfp831xd6i0zalxe97ja
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२३
104
110284
229817
2026-05-06T17:01:14Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "विठ्ठलपंतांनाही दुसऱ्या दिवशी असा आदेश मिळाला, 'विठ्ठलपंता, तुझ्या ठिकाणी ज्ञान, भक्ती व वैराग्य पूर्णरूपाने आहे. तुझ्यापासून सिद्धोपंतांच्या कन्येच्या उदरी ब्रह्मा, विष्णू व..."
229817
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>विठ्ठलपंतांनाही दुसऱ्या दिवशी असा आदेश मिळाला, 'विठ्ठलपंता, तुझ्या
ठिकाणी ज्ञान, भक्ती व वैराग्य पूर्णरूपाने आहे. तुझ्यापासून सिद्धोपंतांच्या
कन्येच्या उदरी ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन देवता आणि आदिशक्ती जन्माला
येणार असल्यामुळे तिच्याशी विवाह करावा.' त्यानुसार त्यांचे लग्नही झाले. पण
पुढे विठ्ठलपंतांना वैराग्य प्राप्त झाल्यामुळे, ते पत्नीच्या अनुमतीवाचून संन्यास
घेऊन काशीस जाऊन राहिले. परंतु ज्या थोर ब्रह्मनिष्ठ यतीच्या हस्ते संन्यासदीक्षा
घेतली, त्याच यतीच्या आदेशावरून संन्यासाश्रम सोडून पुन्हा गृहस्थाश्रमी झाले.
काशीहून आळंदीस येऊन राहिले व बारा वर्षे गृहस्थाश्रमाचे आचरण केले. ही
सर्व नियतीचीच योजना की, एका निर्विकार व निवृत्त जीवाच्या ठिकाणी
प्रवृत्तीचा कोंब उगवून, ब्रह्माला व आदिशक्तीला आपले निर्गुण रूप सोडून
सगुण रूपात अवतरित व्हावे लागले. निर्गुण व निराकार अशाला सगुण साकारात
येण्याकरता गंगेप्रमाणे पवित्र व निर्मळ बीजाची आवश्यकता असणे उघड आहे.
म्हणून त्यांच्या संन्यस्त वृत्तीतच त्यांच्या संसाराचे श्रेष्ठत्व साठवलेले दिसून येते.
विठ्ठलपंतांच्या निरिच्छ वृत्तीतूनच निवृत्ति, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या
भावंडांचा जन्म झाला.
विठ्ठलपंताचे सर्वच जीवन दुःख व आपत्तीत व्यतीत झालेले दिसते.
परंतु त्याही अवस्थेत श्रेष्ठ व ज्ञानी विद्वज्जनांचा त्यांनी कधी अवमान केला नाही.
इतकेच नव्हे तर देहान्त प्रायश्चित्ताची आज्ञा झाल्यावर तीही त्यांनी शिरसावंद्य
मानली. स्वत:च्या लहान बालकांना थोरल्या निवृत्तिनाथांवर सोपवून
समाजजीवनातून बहिष्कृत अशा अवस्थेत त्यांना सोडून, त्रिवेणीत आत्मोत्सर्ग
करण्याकरता ते निघून गेले. एवढे विलक्षण साहस, तेही ज्ञानाच्या, संयामाच्या व
धैर्याच्या आधारावर ! 'केवळ चिदंशाचा पाईक' अशी शुद्ध जाण असल्याशिवाय
असे धैर्य येणे शक्य नाही. 'शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।' याचा
साक्षात् प्रत्यय म्हणजे ही चार भावंडे. १
शके ११९५ मध्ये निवृत्ति, शके ११९७ मध्ये ज्ञानेश्वर, शके ११९९
मध्ये सोपान तर मुक्ताबाई शके १२०१ मध्ये या भूतलावर प्रकटली. २
(जन्मशकाबद्दल अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत. निवृत्तिनाथांचा जन्म ११९०
साली, ज्ञानेश्वरांचा १९९३ मध्ये, सोपानदेवांचा १९९६ मध्ये तर मुक्ताबाईचा
२२<noinclude></noinclude>
5m1shti0qr930nkr0nuz8kfzsgwg3jk
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२४
104
110285
229818
2026-05-06T17:01:28Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "जन्म १९९९ मध्ये झाला असे परंपरा मानते.) आदिशक्तीरूप असणारी मुक्ताबाई जन्मली तीही आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या दिवशी ! मातापित्यांनी देहत्याग केला तेव्..."
229818
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>जन्म १९९९ मध्ये झाला असे परंपरा मानते.) आदिशक्तीरूप असणारी
मुक्ताबाई जन्मली तीही आश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवरात्राच्या पहिल्या
दिवशी !
मातापित्यांनी देहत्याग केला तेव्हा मुक्ताबाई अवघी चार वर्षांची होती.
त्र्यंबकेश्वरी आईवडिलांसह केलेले भ्रमण ही मुक्ताबाई आणि त्यांचे मातापिता
यांच्या संबंधातील महत्त्वपूर्ण घटना म्हणून सांगता येते. त्यातही निवृत्तिनाथांच्या
शोधासाठी निर्माण झालेली अस्वस्थता, मुलांना धर्मात प्रवेश मिळावा यासाठी
असणारी दुश्चित्तता यामध्ये मातापिता व्यग्र असणार. तेव्हा मुक्ताबाईस त्यांच्या
प्रेमळ वात्सल्याचा आलेला अनुभवही तुटपुंजाच असणार, हेही उघड आहे.
तीन ज्ञानी भावंडांच्या पाठीवर जन्माला आलेली मुक्ताबाई आईवडिलांच्या
मृत्यूनंतर अशा परिस्थितीत एकदम प्रौढ न बनली तरच नवल ! आई आणि
वडील जेव्हा या भावंडांना सोडून गेले तेव्हा निवृत्ति आणि ज्ञानेश्वर कोरान्न
आणायला जात असत आणि सोपानदेव मुक्ताबाईला सांभाळत असत.
आईवडिलांविना पोरकी झालेली ही भावंडे, त्यांच्यावर मायेची पाखर घालण्याचे
कार्य सर्वात लहान असूनही मुक्ताबाईने केलेले आढळते. लहानशी मुक्ता
बालपण फारसे न अनुभवताच एकदम पोक्त झाली.
बिकट अशा परिस्थितीमुळे मुक्ताबाई भौतिकदृष्ट्या एकदम पोक्त
झाली तर दुसरीकडून सद्गुरु निवृत्तिनाथांनी नाथसंप्रदायाची दीक्षा दिल्याने ती
आध्यात्मिकदृष्ट्याही प्रौढ बनली.
'आसनाचिया पाउटी । प्रौढ व्हावे सद्गुरुच्या पोटी
तेथे आत्मगुह्याचिया गोष्टी । संपादाव्या ॥ ३
हा मुक्ताबाईचा स्वत:चा अनुभव होता. अशा रीतीने अगदी लहान वयातच
मुक्ता ही मुक्ताबाई बनली, मुक्ताई बनली.
निवृत्तिनाथ हे मुक्ताबाईचे दीक्षागुरु. ज्ञानेश्वरांनाही निवृत्तिनाथांनीच
दीक्षा दिली होती त्यामुळे ज्ञानेश्वर व मुक्ताबाई या दोघांमध्ये आता केवळ
लौकिक बहिणभाऊ असे नाते शिल्लक राहिले नव्हते. तर ते आता
गुरुबंधुभगिनी बनले होते. सद्गुरु केंद्रस्थानी मानून त्यांच्याभोवती प्रेम, आदर,
भक्ती, ज्ञान इ. ची गुंफण या दोघांमध्ये समानतेने घडत होती. आणि म्हणूनच
२३<noinclude></noinclude>
902k62m7pgjqyjdjrf7onv9hntoxwcl
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२५
104
110286
229819
2026-05-06T17:01:38Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "केवळ कौटुंबिक नात्यामधून येणाऱ्या जवळिकीपेक्षा या दोघांमध्ये विशेष असा अनुबंध निर्माण होत गेला. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये एक समजदार गुंफण होत होती. निवृत्तिनाथा..."
229819
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>केवळ कौटुंबिक नात्यामधून येणाऱ्या जवळिकीपेक्षा या दोघांमध्ये विशेष असा
अनुबंध निर्माण होत गेला. ज्ञानेश्वर आणि मुक्ताबाई यांच्यामध्ये एक समजदार
गुंफण होत होती. निवृत्तिनाथांनी दिलेल्या साधनामार्गावरून दोघेही सहप्रवास
करीत होते. मुक्ताबाईला आलेल्या शंका तिने ज्ञानेश्वरांना विचाराव्यात आणि
ज्ञानेश्वरांनी तिचे समाधान करावे, ज्ञानेश्वरांच्या मार्गदर्शनाने मुक्ताने पुढची
वाटचाल सुरु करावी असे सारे चालले होते.
"मूळद्वारी दादा स्थापिला गणपती । माया ही उत्पत्ती कैशी झाली ॥
मायेचा बंबाळ जाये एकसरा । इच्याही आधारा सांगा दादा ॥
ब्रह्मांड व्यापिले आकाश कवळिले । सर्व काही व्यापिले मायेनेचि ॥
माया कैशी दादा सांगता निर्गुण । मुक्ताबाई म्हणे भिन्न फोडा ॥। ४
अशा प्रकारचे गूढ, गहन, गंभीर प्रश्न मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना विचारत असे. तिची
जिज्ञासा पाहून ज्ञानेश्वरही तिला भरभरून ज्ञान बोध देत असत. मुक्ताबाई
त्याआधारे रोजच्या रोज स्वतःची उन्नती करून घेत होती. असे चालू असतानाच
एक दिवस मुक्ताबाईला एक विलक्षण अनुभव आला. त्या अनुभवाबद्दल ती
ज्ञानेश्वरांना सांगू लागली,
" सहज समाधि लागली निर्गुणी । खुंटलीसे वाणी न चले पुढे ॥
खुंटला हा शब्द राहिला व्यवहार । झाला साक्षात्कार सदोदित ||
गळाली इंद्रिये राहिलेसे मन । झाले महाशून्य एकाएकी ।। " ५
ज्ञानेश्वरांना मुक्ताबाईने प्राप्त करून घेतलेल्या उच्च दशेची जाणीव झाली आणि
मुक्ताबाईस त्यांनी अत्यंत समाधानाने म्हटले,
"आठवे समाधिचे अंग आले तुज । आता नाही काज आणिकांसी ॥
ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई । निवृत्तिचे पायी सर्व
सुख ||"
६
एक निश्चित अशी उच्च दशा प्राप्त झाल्यावर ज्यांच्यामुळे हे घडते
त्यांच्याबद्दल तिच्या मनात अपार अशी कृतज्ञतेची भावना निर्माण झाली.
"वरी निवृत्तिकृपा । पुढे ज्ञाननंदादीपा ।
सोय जाली मूल सरिता । लंघावया ॥" ७
असे उद्गार तिच्या मुखातून नकळत प्रस्फुटित झाले.
सद्गुरुबद्दलची ही तिची कृतज्ञता तिच्या प्रत्येक लहानसहान
२४<noinclude></noinclude>
h244z52kystmx4gd5ujgbn6c9yol3d7
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२६
104
110287
229820
2026-05-06T17:01:51Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कृतीमधूनही व्यक्त होत होती. सद्गुरुचा कोणताही शब्द ती खाली पडू देत नसे. आणि एक दिवस निवृत्तिनाथांनी सहज तिच्यापाशी मांडे खाण्याची इच्छा प्रदर्शित केली. तेव्हा मुक्ताबाईने मांड..."
229820
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>कृतीमधूनही व्यक्त होत होती. सद्गुरुचा कोणताही शब्द ती खाली पडू देत नसे.
आणि एक दिवस निवृत्तिनाथांनी सहज तिच्यापाशी मांडे खाण्याची इच्छा
प्रदर्शित केली. तेव्हा मुक्ताबाईने मांडे तयार करण्यासाठी लागणारी सारी
पूर्वतयारी केली आणि मातीचे परळ आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेली. परळ
घेऊन निघालेल्या मुक्ताबाईला वाटेतच विसोबा चाटीने हटकले. तिच्या
हातातील परळ हिसकावून घेतले, ते फोडून टाकले आणि आता पुन्हा कोणीही
मुक्ताबाईला परळ देऊ नये अशी ताकीदही कुंभारवाड्यात त्याने सर्वांना दिली.
विसोबा हे त्या गावातील मोठे प्रस्थ होते. अडीअडचणीला सर्वांना पैश्यासाठी
त्याचेच पाय धरावे लागत. तेव्हा त्यांचा उगाच रोष नको म्हणून सर्वांनीच
विसोबांची ही आज्ञा पाळली. मुक्ताबाई निराश होऊन घरी परतली. सदगुरुंची
एक साधीशी इच्छाही आपणास पुरी करता येऊ नये याचे तिला विलक्षण दुःख
झाले होते. तिचा उतरलेला चेहरा पाहून तिच्या मन:स्थितीची कल्पना
ज्ञानेश्वरांना आली. मुक्ताबाईची अडचण सोडविण्यासाठी मग त्या योग्याने
योगप्रक्रियेने स्वत:चा जठराग्नि प्रज्वलित केला आणि त्यावर मुक्ताबाईने मांडे
भाजले. या भावंडांची फजिती पाहावी या हेतूने आलेले विसोबा हा सारा प्रकार
पाहून आश्चर्यचकित झाले. या मुलांच्या असामान्यतेची त्यांना कल्पना आली.
त्यांचे उच्छिष्ट सेवन केल्याने आपल्या पापांचे प्रायश्चित होऊन आपला उद्धार
होईल या कल्पनेने विसोबा त्यांचे उष्टे अन्न खाऊ लागले. “विसोबा, तू
खेचराप्रमाणे (भूताप्रमाणे) उष्टे का खातोस ?" असा प्रश्न मुक्ताबाईने तेव्हा
केला. तर ज्ञानेश्वरांनी त्यांना 'परता सर' असे म्हटले. 'परता सर' हे ज्ञानेश्वरांचे
शब्द ऐकताच, तोच जणू गुरुपदेश असे मानून, तेच शब्द प्रमाण मानून 'विसोबा
टीप : येथे मुक्ताबाईच्या जीवनाचा विचार करत असताना सर्वरूढ असलेल्या अशा
काही आख्यायिकांचा आधार घेतला आहे. ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताबाईने मांडे
भाजणे, ज्ञानेश्वरांनी भिंत चालविणे, किंवा रेड्यामुखी वेद वदविणे हे प्रसंग आख्यायिकेच्या
रूपाने जनमानसात रूढ आहेत. त्यापाठीमागच्या वैज्ञानिक किंवा आध्यात्मिक रहस्याचा
शोध येथे घेतलेला नाही. कारण या आख्यायिका प्रामुख्याने ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी
निगडीत आहेत. तेव्हा मुक्ताबाईच्या चरित्रामध्ये त्या फक्त संदर्भादाखलच घेतल्या
आहेत, हे येथे नमूद करावेसे वाटते.
२५<noinclude></noinclude>
0t8d4dre674l2s0jag10155pt8oh0h7
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२७
104
110288
229821
2026-05-06T17:02:15Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी यांच्या पलीकडे सरकले. परेच्याही परते जाऊन स्थिरावले. आता ते 'विसोबा खेचर' या नावाने ओळखले जाऊ लागले. निमित्त होते छोट्याशा प्रसंगाचे पण त्यातूनच केवढा म..."
229821
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी यांच्या पलीकडे सरकले. परेच्याही परते जाऊन
स्थिरावले. आता ते 'विसोबा खेचर' या नावाने ओळखले जाऊ लागले. निमित्त
होते छोट्याशा प्रसंगाचे पण त्यातूनच केवढा महान परिणाम साधला गेला होता.
आता आळंदी केव्हाच मागे पडली होती. आळंदीकर ब्राह्मणांचे पत्र
घेऊन चारही भावंडे शुद्धिपत्र मिळविण्यासाठी पैठणला आली. ब्रह्मसभेपुढे या
भावंडांनी आपापली नावे सांगितल्यावर सर्वांनी त्यांची खिल्ली उडविली.
'निवृत्ति नाम आणि प्रवृत्ती बांधला । सोपान अवघडला प्रत्यवाई ।
मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी । ज्ञानदेवो आणि पातित्य भोगी ॥' ८
अशा प्रकारच्या हेटाळणीला त्यांना तोंड द्यावे लागले. स्वाभिमानी अशा
मुक्ताबाईस ही अवहेलना जिव्हारी लागून राहिली असावी. मात्र याप्रसंगी तिने
आपले स्वत:चे मूळ रूप उघड करून दाखविले नाही. 'ज्ञाना' हेच नाव
असणाऱ्या रेड्याकडून वेद म्हणून दाखवावेत असा आव्हानात्मक प्रसंग
ज्ञानेश्वरांपुढे उभा ठाकला. निवृत्तिच्या आज्ञेने आणि मुक्ताबाई व सोपान यांच्या
प्रोत्साहनाने ज्ञानेश्वरांनी ते आव्हान लीलया पेलले. पशुमुखातून वेद ऐकण्यास
मिळाल्यावर मात्र सारेजण आश्चर्यचकित न झाले तरच नवल !
९
'हे तिन्ही अवतार तीन देवाचे । आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली ॥'
अशा शब्दात त्या साया ब्रह्मवृंदाची प्रतिक्रिया व्यक्त झाली. या भावंडांना क्षुद्र
लेखणाऱ्या पैठणकरांनीच
'ज्ञानेशो भगवान विष्णुः निवृत्तिर्भगवान हरः ।
सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ।।' १०
असा त्यांचा गौरव केला. पैठणमध्ये अनेक ग्रंथांचे अवलोकन या भावंडांनी
केले. कालिकेचे दर्शन, वेदांतव्याख्यानप्रवचने असा त्यांचा दिनक्रम पैठणमध्ये
चालू होता. पुराण, हरीकिर्तन या साऱ्यामुळे त्यांनी पैठणकरांची मने जिंकून
घेतली होती. मुक्ताबाई मात्र जेव्हा पाहावे तेव्हा तुर्यावस्थेतच दिसे.
'तुर्यावस्थारता सुता मुक्ता' ११ असेच मुक्ताबाईचे सर्वांना दर्शन घडत होते.
स्वत:च्या शब्दपांडित्याच्या आधारावर स्वतःला ज्ञानी म्हणवून घेणारी
विद्वत्मंडळी, आणि केवळ त्यांच्या कोरड्या, पोकळ शब्दांनीसुद्धा त्यांच्या
भजनी लागणारी सामान्य जनता, चमत्काराने भारावून जाणारी सामान्य जनता,
२६<noinclude></noinclude>
g9o55815x7arlym3dfm59hhhfo0lfk1
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२८
104
110289
229822
2026-05-06T17:02:36Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "या साऱ्यांचे एक व्यापक स्वरूपाचे दर्शनच जणू येथे ज्ञानदेवांना घडत होते. विद्वज्जनांच्या क्षेत्रातच शब्दज्ञानाची, पोकळ पांडित्याची शुद्धज्ञानावर होणारी कुरघोडी ते उघड्या डोळ..."
229822
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>या साऱ्यांचे एक व्यापक स्वरूपाचे दर्शनच जणू येथे ज्ञानदेवांना घडत होते.
विद्वज्जनांच्या क्षेत्रातच शब्दज्ञानाची, पोकळ पांडित्याची शुद्धज्ञानावर होणारी
कुरघोडी ते उघड्या डोळ्यांनी पाहत होते. शब्दशास्त्राने विलक्षण क्लेश झालेले
ज्ञानेश्वर, वारंवार चिंतनमग्न झालेले मुक्ताबाई पाहत होती. ज्ञानेश्वरांमधला
हळूहळू होत चाललेला बदल तिच्या सूक्ष्म नजरेला जाणवत होता. ज्ञानाची
कवाडे ते मिटून घेत आहेत आणि दिवसेंदिवस जास्त जास्तच आत्ममग्न होत
चालले आहेत हे तिला जाणवत होते. साऱ्या जगावरच रुष्ट झाले असावे असे
ज्ञानेश्वरांचे हे वागणे पाहून मुक्ताबाईला त्यातील गांभीर्य लक्षात आले. दोघांच्या
नात्यातील लडिवाळपणाचा आधार घेत मुक्ताबाईने ज्ञानेश्वरांना समजावले,
"योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ।
विश्वरागे झाले वन्ही । संते सुखे व्हावे पाणी ।
वाळ मुक्ताबाई | जीव मुदल ठायीचे ठायी ।
तुम्ही तरुनि विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ।।" १२
मुक्ताबाईच्या विनवणीचा अचूक परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला. आपले
आत्ममग्नतेचे स्वतःभोवती आखलेले परिघ ओलांडून ज्ञानेश्वर 'ब्रह्मविद्येचा
सुकाळ' करण्याच्या हेतूने आता कार्यप्रवृत्त झाले. नेवासे येथे
'भावार्थदीपिके'च्या निर्मितीने या कार्यास प्रारंभ झाला. भावार्थदीपिकेच्या
(ज्ञानेश्वरी) निर्मितीचे एक समाधान बाळगत ही सारी भावंडे आता आपल्या
गावी परत निघाली होती. वाटेत चालताचालताही कोणाकोणाला कवित्वाची
स्फूर्ती यावी, त्याने ते म्हणून दाखवावे, दुसऱ्याने ते उतरवून घ्यावेत अशा रीतीने
मजल दरमजल करत सारी जण आळंदीस परतली. शुद्धिपत्र मिळवून आलेल्या
या भावंडांबद्दलची आळंदीकरांची सुरुवातीची तीव्र निषेधात्मक प्रतिक्रिया
आता बदलली होती. त्याची जागा आता आदराने घेतली होती.
ज्ञानेश्वरांनी पैठणात दाखविलेल्या चमत्काराचे वृत्त कर्णोपकर्णी
चांगदेवांच्या कानावर गेले. 'वंचूनिया काळा रक्षिले शरीर । बहुत दिस भार
वाढविला । परी हे सामर्थ्य नाही आम्हा अंगी । १३ याची जाणीव चांगदेवांना
मनोमन झाली. ज्ञानेश्वरादी भावंडांच्या भेटीविषयी कुतूहल त्यांच्या मनात जागे
झाले. परंतु भेटीपूर्वी पत्र पाठवावे या हेतूने ते पत्र लिहावयास बसले. ज्ञानेश्वरांना
२७<noinclude></noinclude>
8dmkpfmndxq4t5c4mj5te5y5qc50qj5
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/२९
104
110290
229823
2026-05-06T17:02:51Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "उद्देशून तीर्थरूप लिहावे का चिरंजीव लिहावे या संभ्रमात पडलेल्या चांगदेवांनी ज्ञानेश्वरांना कोरेच पत्र पाठवून दिले. ज्ञानेश्वरांनी निवृत्तिनाथांच्या आज्ञेने चांगदेवांना पा..."
229823
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>उद्देशून तीर्थरूप लिहावे का चिरंजीव लिहावे या संभ्रमात पडलेल्या चांगदेवांनी
ज्ञानेश्वरांना कोरेच पत्र पाठवून दिले. ज्ञानेश्वरांनी निवृत्तिनाथांच्या आज्ञेने
चांगदेवांना पासष्ट ओव्यांचे पत्र पाठवून दिले. हे पत्र वाचूनही चांगदेवांना काहीच
अर्थबोध झाला नाही. तेव्हा आता या भावंडांची समक्ष भेट घेतल्याशिवाय
तरणोपाय नाही हे जाणून चांगदेव वाघावर बसून भेटीसाठी आले. निवृत्तिनाथांनी
ज्ञानदेवांना चांगदेवांची योग्यता समजावून सांगितली आणि चांगदेवांच्या
भेटीसाठी त्यांना सामोरे जाण्याची आज्ञा केली. स्वतःच्या सिद्धीसामर्थ्याचे
प्रदर्शन करत येणाऱ्या चांगदेवांना पाहून मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणाली,
"विरक्त म्हणवी आणि इच्छेचा पाईकु । तयाचा विवेक जाळी परता ।
षट्शास्त्रवक्ता आणि वितंडवादकु । तयाचा विवेक जाळी परता ।
योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकु । तयाचा विवेक जाळी परता ।
मुक्ताई म्हणे जयाचा परमार्थ माइकु । तयाचा विवेक जाळी परता ।। " १४
चांगदेवांचा अहंकार समूळ नष्ट व्हावा या हेतूने मग ज्ञानेश्वरांनीही एक क्लृप्ती
केली. चांगदेवांच्या भेटीसाठी ज्ञानेश्वरादी भावंडे भिंतीवर बसूनच सामोरी गेली.
भिंत चालवलेली पाहून चांगदेवांचा उरलासुरला अहंकारही नष्ट झाला. ते शरण
आले. “वरदहस्त आता मस्तकी ठेवावा" १५ अशी विनवणी त्यांनी केली.
निवृत्तिनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर या तिघांनीही चांगदेवास मुक्ताबाईकडे
सोपवले. “यासी करा प्रतीत आत्मज्ञानी ॥ " १६ असे निवृत्तिनाथांनी
मुक्ताबाईला सांगितले. मुक्ताबाईच्या चरणी लागलेल्या चांगदेवांच्या माथ्यावर
मुक्ताबाईंनी हात ठेवला. चांगदेवाला निजबोध प्राप्त करून दिला. बहुता वर्षांचा
राजयोगी क्षणांचाही विलंब न लागता मुक्ताईकृपेमुळे जीवन्मुक्त झाला. येथेच
मुक्ताबाईनी चांगदेवांना चांगदेवपासष्टीचा अर्थ समजावून दिला. नव्हे,
चांगदेवांना जणू त्याचा अर्थ सर्वांगी लेवविला. चांगदेव जणू अर्धरूपच बनले.
मुक्ताबाई सद्गुरुपदी आरूढ झाली होती आणि तिचे परमशिष्य चांगदेव म्हणत
होते,
"चांगदेव म्हणे आजिची जन्मलो । गुरुपुत्र झालो मुक्ताईचा ।
मागील चौदाशे झाली जन्मांतरे । आजी जन्म खरे सार्धकाचे ।। " १७
आपली ही कृतकृत्यता व्यक्त करावी या हेतूने चांगदेवाने सद्गुरु मुक्ताबाईची
२८<noinclude></noinclude>
rtw8wtvogrs5hx4s13emve3x20vat3i
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३०
104
110291
229824
2026-05-06T17:03:06Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "१८ आणि इतर तिन्ही भावंडांची पूजा केली. 'मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कळा । नित्य मुक्तलीळा दावी अंगी ।' या भावनेने चांगदेवांनी ही पूजा आरंभिली होती. वेदपठण, मंगलवाद्ये यांच्या उ..."
229824
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>१८
आणि इतर तिन्ही भावंडांची पूजा केली. 'मुक्ताई मुक्तरूप मुक्तीची चित्कळा ।
नित्य मुक्तलीळा दावी अंगी ।' या भावनेने चांगदेवांनी ही पूजा आरंभिली
होती. वेदपठण, मंगलवाद्ये यांच्या उत्तम घोषामध्ये ही पूजा पार पडली. सुवर्ण
दक्षिणा, गोदान देऊन नगरवासियांना भोजन दिले गेले. एक प्रकारचा अदभुत
असा सोहळा या निमित्ताने लोकांना पाहावयास मिळाला.
ज्ञानेश्वरादी भावंडांची कीर्तिकथा पंढरपूरातील नामदेवांच्या कानावर
एव्हाना येऊन पोहोचली होती. या मंडळींच्या भेटीसाठी जावे असे नामदेवाला
पंढरपूरच्या विठ्ठलानेही सुचविले होते. आणि म्हणून त्यांची भेट घ्यावी या
उद्देशाने एक दिवस नामदेव या भावंडांकडे आले.
भक्तीच्या बळावर देवाला वश करून घेतलेला अशी थोर भक्त म्हणून
नामदेवाचीही सर्वत्र ख्याती होती. तेव्हा असा भक्त आपल्याकडे आला म्हणून
निवृत्ति, सोपान, ज्ञानेश्वर यांनी त्यांचे उत्तम स्वागत केले. निवृत्तिनाथांनी
नामदेवांना वंदन केले तेव्हा; 'देवाचे जवळ आपण कायम असतो, स्वतः परब्रह्म
माझ्याजवळ असते तेव्हा यांनी आपल्याला वंदन करणे योग्यच आहे' असा
समज नामदेवांनी करून घेतला व आपण मात्र त्यांच्या पाया पडण्याची काहीच
आवश्यकता नाही असे नामदेवांचे मत झाले.
नंतर ज्ञानेश्वरांनीही नामदेवांना वंदन केले, तेव्हा आपण यांच्यापेक्षा
वयाने वडील तेव्हा ज्ञानेश्वरांनी आपल्याला नमस्कार करणे योग्यच आहे असे
त्यांच्या मनात आले. सोपानदेवांनी आपले जणू काही मायबापच भेटले अशा
भावनेने नामदेवांना वंदन केले.
राहून
निवृत्ति, ज्ञानेश्वर, सोपान यांनी नामदेवांना केलेले नमन आणि त्यावर
नामदेवांची झालेली प्रतिक्रिया याचे सूक्ष्म अवलोकन मुक्ताबाई दूर उभी
करत होती. नामदेवांचा अहंकार तिच्या चाणाक्ष नजरेने लगेचच हेरला आणि
तिने नामदेवांचे दर्शन घेण्याचे नाकारले. नामदेवाबद्दल तिचे जे मत तयार झाले
ते तिने स्पष्ट शब्दात आपल्या भावंडांजवळ व्यक्त केले.
"अखंड जयाला देवाचा शेजार । का रे अहंकार नाही गेला ।
मान अपमान वाढविसी हेवा । दिवस असता दिवा हाती घेसी ।
परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ । आंधळ्या डोळे डोहळे का बा झाले ।
२९<noinclude></noinclude>
sey9faii9gvis29kso3ywj5mqq5an8o
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३१
104
110292
229825
2026-05-06T17:03:18Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कल्पतरु तळवटी इच्छिली ते गोष्टी । अद्यापि नरोटी राहिली का ।। १९ असा रोकडा सवाल तिने नामदेवांना केला. एका थोर भक्तापुढे मुक्ताबाईने असे वक्तव्य करावे ही गोष्ट तिन्ही भावंडांना अ..."
229825
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>कल्पतरु तळवटी इच्छिली ते गोष्टी । अद्यापि नरोटी राहिली का ।। १९
असा रोकडा सवाल तिने नामदेवांना केला. एका थोर भक्तापुढे मुक्ताबाईने असे
वक्तव्य करावे ही गोष्ट तिन्ही भावंडांना अनपेक्षित अशीच होती.
नामदेवांसारख्या भक्ताची पायधूळ कपाळाला लावली तर वंशही समूळ उद्धरून
जातात असे सांगून निवृत्ति आदी भावंडांनी मुक्ताबाईची समजूत घालण्याचा
प्रयत्न केला. भक्तीपेक्षा इतर दुसरे काही श्रेष्ठ नाही असे नामदेवांनीही मुक्ताबाईस
ऐकविले. मुक्ताबाईने त्यास प्रत्युत्तर देत म्हटले,
" झालासी हरिभक्त तरी आम्हा काय । आतली ती सोय ठाऊकी नाही ।
घेऊनी टाळ दिंडी हरिकथा करिसी । हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणे ।
गुरुविण तुज नव्हेचि गा मोक्ष । होशील मुमुक्षू साधक तू ।
आत्मतत्त्वी दृष्टी नाहीच पा केली । तववरी ब्रह्मबोली बोलूनी काय ।
तुझे रूप तुवा नाही ओळखिले । अहंतेते धरिले कासयासी ।
ऐकरे नामया होई आत्मनिष्ठ । तरीच तू श्रेष्ठ ज्ञानी म्हणे ।। " २०
अशा प्रकारे गुरु केल्याशिवाय तुला मोक्षप्राप्ती होणार नाही हे सत्य मुक्ताबाईने
निर्भिडपणे नामदेवाला कथन केले. “उसाचे शेजारी येरंडाचे झाड । नाही त्याचे
पाडे गोडी आली ।। " २१ अशी नामदेवाची अवस्था असल्याचे मुक्ताबाईने
म्हटले. “कर्पूरासी झाला दीपाचा शेजार । काय गुणे हीर राहिल त्याचा ।। सागरी
लवण टाकिले नेऊन । काय गुण खडेपण उरले त्याचे ॥ तैसा नामदेव विठोबाच्या
जागा | काय गुणे दादा कोरेपण ।। " २२ असा सवाल ती आपल्या भावंडांना करते
आणि पुढे स्वत:च त्याचे उत्तरही देते. नामदेवाची परिस्थिती अशी का झाली याचे
कारण देताना ती म्हणते, “ म्हणे मुक्ताबाई चंदनाचे झाड । अहंता सर्प वेढे
|" २३ " चांगदेवा वाणी । भाजावा सज्जनी नामदेव ॥"
गुंडाळले || "
२४ असा
सल्लाही तिने आपल्या भावंडांना दिला आहे.
निवृत्तिनाथ आता वडिलकीच्या नात्याने मुक्ताबाईंची समजूत घालू
लागले. आपल्या घरी भाग्यानेच असे संत येतात, संतांचा सन्मान करण्यास
आपण कधीही चुकू नये, आपण आपले स्वहित करावे, या नामदेवांच्या प्रेमामुळे
विठ्ठलसुद्धा वेडा झाला आहे तेव्हा त्यांच्याबरोबर अशी अरेतुरेची भाषा योग्य
नाही असे निवृत्तिनाथांनी मुक्ताबाईस हरप्रकारे समजावले. परंतु मुक्ताबाई
३०<noinclude></noinclude>
jy039qjeubvb31t2t1xfwsyk6unx52p
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३२
104
110293
229826
2026-05-06T17:03:30Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "आपल्या मतावर ठाम होती. " म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण । आपणा दर्शन न लगे त्याचे ।। " २५ हेच मुक्ताबाईंचे त्यावरचे उत्तर होते. मुक्ताबाई येथे आपल्या वडिलबंधूंना, सद्गुरुला विरोध कर..."
229826
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>आपल्या मतावर ठाम होती. " म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण । आपणा दर्शन न
लगे त्याचे ।। " २५ हेच मुक्ताबाईंचे त्यावरचे उत्तर होते.
मुक्ताबाई येथे आपल्या वडिलबंधूंना, सद्गुरुला विरोध करताना दिसते.
यावरून त्यांचे वागणे हे आढ्यतेचे असल्यासारखेही कदाचित वाटण्याची शक्यता
आहे पण त्यांच्या वागण्यामागील भाव पाहिला म्हणजे या सान्या कृतीमागे
नामदेवाविषयी अपार करुणाच कशी त्यांच्या मनात भरलेली आहे याचा प्रत्यय
येईल.
मुक्ताबाई निवृत्तिनाथांना म्हणाली, “कुलालाचे कुंभ भाजल्याविण
माती । काय साहे संगती पाणियाची ॥ मेणाची पुतळी घेता करी बरी । अग्नीचे
शेजारी राहे कैशी ॥" २६ तेव्हा नामदेवासारख्या सज्जनाला असे वाया जाऊ
देऊ नये, असे ती म्हणते. " म्हणे मुक्ताबाई जाऊ देऊ नये । ऐसे सरिसे काय
भांडे करा ।। " २७ नामदेव हरीपाशी निशीदिनी वरदळ लावतो म्हणून पांडुरंगानेच
तुम्हापाशी त्याला पाठविले आहे. त्याचा उद्धार तुम्ही संतजन तत्काळ कराल
म्हणूनच पांडुरंगाने नामदेवाला तुमच्यापाशी पाठविले आहे. तेव्हा आता तुम्ही
तुमचे ब्रीद सार्थ करून दाखवा, नामदेवाला पावन करून घ्या, अशी विनवणी
मुक्ताबाई आपल्या भावंडांना करीत आहे. यामध्ये तिचा अहंकार नाही,
आढ्यता नाही, आहे ती फक्त नामदेवाच्या उद्धाराविषयीची अपार कळकळ !
एका अहंकारापायी नामदेवासारखा उत्तम भक्त वाया जात आहे हे तिला पाहवत
नाही आणि म्हणूनच तिने वरीलप्रमाणे विनवणी केली आहे. नामदेवासारख्या
श्रेष्ठ भक्ताला काही सांगावे एवढी आपली योग्यता आहे की नाही याविषयीची
शंका या भावंडांनी मुक्ताबाईपाशी व्यक्त केली असावी. तेव्हा सर्वांनाच मान्य
होईल अशी गोष्ट मुक्ताबाईने मांडली. मुक्ताबाईने सुचविले, “धाडा बोलावणे
गोरोबाला । म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे । काकाचे उत्तर सत्य मानू ।। " २८
गोरोबा सर्वांची परीक्षा करतील आणि ते जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावा
असे एकमताने निश्चित झाले.
हे गोरोबाकाका कोण ? नामदेवांची परीक्षा घेण्यासाठी तेवढीच
अधिकारी व्यक्ती परीक्षक म्हणून असली पाहिजे हे उघड होते. तेव्हा आपल्या
गुरुपरंपरेतील विख्यात आचार्य गोरक्षनाथ यांनाच मुक्ताबाईने याप्रसंगी निमंत्रण
३१<noinclude></noinclude>
hvvgzkqbnel2zdjs6gg7tcmjgdla73h
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३३
104
110294
229827
2026-05-06T17:03:41Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दिले. अव्यक्त स्वरूपातील गोरक्षनाथांची मुक्ताबाईंनी स्वत:च्या योगसामर्थ्याच्या बळावर भेट घेतली. 'मोतियांचा चूर फेकिला अंबरी । विजुचिया परी कीळ झाले । जरी पितांबरे नेसविली नभा..."
229827
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>दिले. अव्यक्त स्वरूपातील गोरक्षनाथांची मुक्ताबाईंनी स्वत:च्या योगसामर्थ्याच्या
बळावर भेट घेतली.
'मोतियांचा चूर फेकिला अंबरी । विजुचिया परी कीळ झाले ।
जरी पितांबरे नेसविली नभा । चैतन्याचा गाभा निळबिंदू ।
तळीपरी पसे शून्याकार झाले । सर्पाचीही पिले नाचू लागे ।
कडकडोनि वीज निमाली ठायींचे ठायीं । भेटली मुक्ताबाई गोरोबाला ।।' २९
अशा प्रकारे मुक्ताबाई गोरक्षनाथांना भेटली. मुक्ताबाईचे वैराग्य पाहून गोरक्षनाथ
अंत:करणापासून समाधानी झाले आणि तिच्यासाठी, तिच्या वैराग्यावर प्रसन्न
होऊन ते स्वतःला प्रकट करते झाले. मात्र हे प्रकट होणे म्हणजे देहरूपात
प्रत्यक्षात ते तेथे उपस्थित झाले असतील किंवा नाही हे सांगता येत नाही. मात्र
त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना आला असावा हे
निश्चित. त्यावेळी मुक्ताबाईने सुचविले की, “घालू द्या लोटांगण । जाऊ द्या
शरण अव्यक्तासी ।।” ३०
त्याप्रसंगी निवृत्तिनाथांच्या सांगण्यावरून सारी भावंडे ध्यानस्थ बसली.
भ्रमरगुंफेच्या ठिकाणी जाऊन ही भावंडे तिथे स्थिरावली. त्या अवस्थेत त्या
साऱ्यांना विलक्षण असे अनुभव आले.
'रक्तश्वेत पीत नीळ वर्णाकार । नक्षत्राची वर पूजा केली ।
प्रकाशमय तत्त्व ज्योतिमय पाहणे । दीप त्रिभुवनी एक झाला ॥। ३१
अशा प्रकारे आपले अनुभव परस्परांनी परस्परांना सांगितले. भक्त नामदेवांना या
योगानुभवांची काहीच कल्पना नव्हती. नामदेवांची त्यावेळी अवस्था कशी होती?
ते म्हणत होते,
'कैकाड्यावाणी करिती गुडगुड । मजला हे गूढ उमजेना ।
नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे | आम्हा अघोरवाणे दिसतसे ।। ३२
सारी भावंडे ध्यानस्थ बसलेली असताना नामदेव इकडे तिकडे पाहत
होते. या भावंडांच्या घरातील अठराविश्वे दारिद्रयाचे त्यांना तिथे दर्शन झाले.
'हातात नरोटी जीर्णाचे ते भार । परळ भोपळ्यामाजी गृहामाजी संपत्ती । खर्चायला
कवडी धार नसे ॥। २३ अशी या साऱ्या भावंडांची अवस्था आहे हे त्यांना
दिसले. पण असे असूनही दुःखाची कोठेही साधी निशाणीही घरात दिसत नव्हती.
३२<noinclude></noinclude>
qnttdq30z1fhlpu6hfleoj6f1rxqyg2
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३४
104
110295
229828
2026-05-06T17:03:54Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "उलट आनंदाला पारावार नाही, सगळे ब्रह्मांड हाताशी असावे असे एकीकडे त्यांचे बोलणे होते. याही परिस्थितीत आनंदाने डुलणारी ही भावंडे पाहून, त्यांच्या चर्चा ऐकून हे काहीतरी पाखंड असाव..."
229828
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>उलट आनंदाला पारावार नाही, सगळे ब्रह्मांड हाताशी असावे असे एकीकडे त्यांचे
बोलणे होते. याही परिस्थितीत आनंदाने डुलणारी ही भावंडे पाहून, त्यांच्या चर्चा
ऐकून हे काहीतरी पाखंड असावे अशी नामदेवांची समजूत झाली.
नामदेवासारखा महान भक्त भ्रमरगुंफेमध्ये, तेथपर्यंत येऊ शकत नाही हे
पाहून निवृत्तिनाथांनाही खंत वाटत होती. सोपानाने गोरक्षांना विनवणी केली,
" नामदेव पाहुणा आला असे । मुक्तिकेचे पारखी तुम्ही आहा देवा ।
भाजुनी जीवा शिवा ब्रह्म करा ।। " ३४
मुक्ताबाईही विनवणी करत म्हणाली, "म्हणे मुक्ताबाई हेरोनिया हेरा । हिरा
किंवा गारा नेणो बापा ।। ३५.
तेव्हा अनुभवाचे थापटणे हाती असलेल्या गोरक्षनाथांनी सर्वांची परीक्षा
घ्यावयास सुरुवात केली. गोरक्षनाथांनी निवृत्तिनाथांवर कृपावर्षाव केला असता
ते परब्रह्माशी एकरुप झाले. ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी अजिबात कोरेपण शिल्लक
नसल्याचे दिसले, सोपानदेवांच्या बाबतीतही तसेच झाले. मुक्ताबाईला जेव्हा तो
अनुभव दिला तेव्हा तिला अमृत संजीवनी उतू आल्याचा अनुभव आला.
वैराग्याच्या या कसोटीवर नामदेव मात्र उतरू शकले नाहीत. त्यांना तो घाव सहन
झाला नाही. गोरक्षनाथांची कृपा स्वीकारण्यासाठी आवश्यक होती तेवढी त्यांची
आध्यात्मिक तयारी झाली नव्हती म्हणून तो भार ते पेलू शकले नाहीत. "गोरा
म्हणे कोरा राहिला गे बाई । शून्यभर नाही भाजिले कोठे ॥" या शब्दामध्ये
गोरोबांनी आपला निर्णय जाहीर केला.
३६
सर्व संतमंडळीपुढे अवमानित झालेल्या नामदेवांना कधी एकदा आपण
तेथून बाहेर पडतो असे झाले. या साऱ्या प्रकारानंतर मुक्ताबाई म्हणू लागली,
"अंतर बाहेर भाजू आम्ही कुंभ । भरु निरालंब सगळेची ।
अहं सोऽहं दोन्ही उर्ध्व लावू फुंकणी । नवद्वारे फुंकोनि जाळ करु ।
जीवित्व काढुनी शिव घडू अंगा । प्रिय पांडुरंगा आवडेल ।।” २७
मुक्ताबाईचे हे वक्तव्य ऐकून तर नामदेव मनातून चांगलेच घाबरले. या लोकांना
काहीएक न सांगता, विचारता नामदेव त्या ठिकाणाहून तातडीने पंढरपूरला
आले. मनात मुक्ताबाईबद्दल राग खदखदत होता.
" मुक्ताबाईने तेथे माजविली कळी । हे संतमंडळी कपटी तुझी ।
३३<noinclude></noinclude>
h5tjd56uzwbyq50xaj0gafi1c47f0a9
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३५
104
110296
229829
2026-05-06T17:04:04Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "लहानसी मुक्ताई जैसी सणकांडी । केले देशोधडी महान संत ।। " ३८ असे मुक्ताबाईविषयी गा-हाणे नामदेवांनी विठ्ठलापाशी गायले. पुढे विठ्ठलानेही मुक्ताबाईचे हे सारे वागणे योग्यच आहे, नामद..."
229829
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>लहानसी मुक्ताई जैसी सणकांडी । केले देशोधडी महान संत ।। " ३८
असे मुक्ताबाईविषयी गा-हाणे नामदेवांनी विठ्ठलापाशी गायले. पुढे विठ्ठलानेही
मुक्ताबाईचे हे सारे वागणे योग्यच आहे, नामदेवांनी गुरु करणे आवश्यक कसे
आहे हे समजावून सांगितले. विसोबा खेचर हेच तुझे सद्गुरु आहेत असा स्पष्ट
संकेतही विठ्ठलाने नामदेवांना दिला.
नामदेवांच्या चरित्राच्या दृष्टीने जसे या साऱ्या प्रसंगाचे महत्त्व आहे,
तितकेच, किंबहुना त्यापेक्षाही त्याचे अधिक महत्त्व मुक्ताबाईच्या जीवनाच्या
दृष्टीने आहे. या प्रसंगाच्या निमित्ताने जशी नामदेवांची परीक्षा झाली तशीच एक
प्रकारे मुक्ताबाईचीही याप्रसंगी परीक्षा झाली. मुक्ताबाईला स्वत:च्या
आध्यात्मिक सामर्थ्याची प्रचीती यानिमित्ताने आली. तर आपल्या धाकट्या
बहिणीचे असामान्य कर्तृत्व या प्रसंगाच्या निमित्ताने तिच्या भावंडांनाही ज्ञात
झाले. आपल्या बहिणीची योग्यता यामुळे तिच्या भावंडांना पुरेपूर समजून
चुकली. मुक्ताबाईचा आध्यात्मिक स्तर येथे पालटला.
गोरक्षकृपेचा अनुभव जिच्यामुळे आपल्याला आला तिचे, सारी भावंडे
एकप्रकारे कौतुक करू लागली. मुक्ताबाईचे आदिमायेचे असलेले स्वरूप
याप्रसंगी उघड झाले. धाकटी बहीण, सत्शिष्य, गुरुभगिनी ही सारी नाती एका
क्षणात आता मागे पडली आणि मुक्ताबाई मुक्तामाता, माय या रूपात सर्वांना
प्रतीत होऊ लागली. निवृत्तिनाथ मुक्ताबाईस म्हणू लागले, “तेथ माय मी
प्रांजळ । उपकार मानी बहु सबळ । बरवे दाविले स्थळ | विश्रांतीचे ।। " ३९
ज्ञानेश्वर म्हणाले, “तुम्ही जेविला अमृत भोजने । आम्ही ही पंक्तिचे पाहुणे ।
गुह्य गूढ बोलणे । मौन्य जाले ।।” ४० सोपानदेव म्हणत होते, “हे आदिअनादी
भवानी | आदिपुरुषाची मोहिनी । गुरुकृपे आणिता ध्यानी । विश्व वश्य ।। " ४९
या प्रसंगी उपस्थित असलेल्या विसोबा खेचरांच्या प्रश्नावर मुक्ताबाईने
त्यांना सांगितले, "दुजेपण पाहता काहीच न दिसे । उपमेचे भाषे कांही न भाषे ।
मुक्ताई म्हणे विसोबा खेचरा । मी तू नाही तेथे । कैचा दुसरा ॥" ४२
मुक्ताबाईच्या या बोलण्याचा प्रयत्न विसोबांनाही आला. तेही म्हणाले, “शब्द
ना विशब्द कवणाचे कवण । आत्मज्ञान बोध जाले निर्माण । मुक्ताबाई वटेश्वर
तेथे कैचे चांगपण ।।" ४३ निर्गुणाच्या या विलक्षण अनुभवाने सगुणाचे महत्त्व
३४<noinclude></noinclude>
9ihu6u0gzdkbm8p7ar204ot8u8zag73
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३६
104
110297
229830
2026-05-06T17:04:19Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "नाकारु पाहणाऱ्या विसोबांना सोपानदेव म्हणाले, "मुक्त ज्ञानेविण तुम्हा कवण आनंद ||" ४४ मुक्ताबाईची श्रेष्ठता सोपानदेवांनी येथे स्पष्ट करून सांगितली. या साऱ्यांच्या नजरेत मुक्ताब..."
229830
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>नाकारु पाहणाऱ्या विसोबांना सोपानदेव म्हणाले, "मुक्त ज्ञानेविण तुम्हा कवण
आनंद ||" ४४ मुक्ताबाईची श्रेष्ठता सोपानदेवांनी येथे स्पष्ट करून सांगितली.
या साऱ्यांच्या नजरेत मुक्ताबाईंचे स्थान आता उंचावले होते.
मुक्ताबाईच्या आंतरिक जीवनाच्या दृष्टीनेही आता फार मोठा बदल झाला होता.
अमृत संजीवनी उतू आल्याचा अनुभव म्हणजे नाथांचा वरदहस्त तिच्या मस्तकी
असल्याची निदर्शक अशी ती खूण होती. मुक्ताबाईचे शरीर चिरकाळ अभंग
निरंतर राहील ही गोष्ट याचप्रसंगी निर्धारित झाली होती. मुक्ताबाई अधिकाधिक
काळ आत्ममग्न अशा अवस्थेत राहू लागली.
'आपण होऊनि अगोचर । लावूनि नेत्रद्वार ।
मन करावे स्थिर | हृदयामाजि ॥
I
दृष्टि काही न पहावे । मन अढळ राखावे ।
उत्तर कवणा न द्यावे । मुद्रा मौन्य ।। ४५
अशी मौन्य मुद्रा धारण करून मुक्ताबाईचे दिवसच्या दिवस जाऊ लागले.
"ज्ञानासि लाधले निवृत्ति फावले । सोपान घडले दिनकाळ । ते हे रे
सखया खेचरासी पुसे । गुरुनामी विश्वासे ब्रह्मरुपे ।। " ४६ असे म्हणत
निवृत्तिनाथांनी नामदेवाला सद्गुरुला शरण जाण्यास सांगितले. नामदेवाला
सदगुरुची आवश्यकता पटवून देण्यासाठी माध्यम बनलेली मुक्ताबाई मात्र आता
या साऱ्यापासून अलिप्त झाली होती. नामदेव विसोबा खेचरांना शरण जाणार ही
गोष्ट आता निश्चित झाली होती. तिचा कार्यभाग पूर्ण झाला होता.
निवृत्तितटाके निघालेल्या मुक्ताबाईच्या हृदयामध्ये हरिराज सामावला
होता. 'मुक्ताईस अवघेचि वैकुंठ निघोट रया ।।' ४७ असा
'मुक्ताई दिवस अवघा हृषीकेश । केशवेविण वास शून्य पैसे
अनुभूती होती.
अनुभव येत होता.
।।' ४८ ही तिची
परमेश्वराच्या भेटीसाठी इतरत्र कोठेही जाण्याची आवश्यकता
मुक्ताबाईला आता भासत नव्हती. 'का आपुला ठावो न सांडिता । आलिंगिजे
चंद्रु प्रकटता । हा अनुरागु भोगिता । कुमुदिनी जाणे ॥। ४९ ही कुमुदिनीची कला
मुक्ताबाईस साध्य झाली होती. या साऱ्या अवस्थेमुळे तिचा संसाराशी अबोला
झाला होता. कोणाशी काही बोलू नये, आपल्या आत्मस्थितीमध्ये मग्न राहावे ही
३५<noinclude></noinclude>
sbcie1cst72cw2jcye5jvog8z9ed3ql
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३७
104
110298
229831
2026-05-06T17:04:30Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ओढ दिवसेंदिवस वाढत चालली होती. अशातच एक दिवस ज्ञानेश्वरांनी नामदेवांबरोबर तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा प्रदर्शित केली. "वेदाचिया मते तीर्थी देव आहे । देशोदेशी काय उणा जाला । अष..."
229831
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ओढ दिवसेंदिवस वाढत चालली होती.
अशातच एक दिवस ज्ञानेश्वरांनी नामदेवांबरोबर तीर्थयात्रेला जाण्याची
इच्छा प्रदर्शित केली.
"वेदाचिया मते तीर्थी देव आहे । देशोदेशी काय उणा जाला ।
अष्टोत्तरशते तीर्थे जयाच्या भीतरी । तो तुझे अंतरी आत्माराम । " ५०
असे तिने ज्ञानेश्वरांनाही समजाविण्याचा प्रयत्न केला. "न लगती तीर्थे हरिरुपे
मुक्त । अवघेचि सूक्त जपिनले ।।" ५१ असे सांगून तिने तीर्थयात्रेला न येण्याचा
स्वत:चा निर्णयही उघड केला. मुक्ताबाई, चांगदेव, वटेश्वर आदी काही मंडळी
तीर्थयात्रेस न जाता तेथेच थांबली. मुक्ताबाईच्या उपदेशामुळे, गहन मार्ग आता
मोकळा होत चालला आहे, सोपा होत चालला आहे असे शिष्यांना जाणवू
लागले.
'मुक्त होतासि तो का बद्ध झालासी । आपल्या बंधने आपण बांधलासी ।
सांडी बंधन सोय घरी गव्हारा । जाई मूळस्थाना आपुलिया ।
तेथीच्या तेथे राही परियेसी । चांगया बोले मुक्ताईशी ।। ' ५२
मुक्ताबाईच्या जवळ वावरणाऱ्या शिष्यांना, साधकांना मुक्ताबाईचे आता एक
वेगळेच दर्शन घडू लागले होते. कोणत्या तरी साध्या व्यावहारिक गोष्टीचे निमित्त
घडावे आणि त्या साध्या प्रसंगाच्या निमित्ताने मुक्ताबाईने, त्याच्या आधारे फार
मोठे गहन तत्त्वज्ञान मांडावे, त्याची चर्चा करावी असे आता घडू लागले.
मुक्ताबाईला ध्यानावस्थेमध्ये उच्चतर असे अनुभव यावेत आणि तिने
ते चांगदेवाजवळ बोलून दाखवावेत असेही वारंवार घडत असे.
"मुंगी उडाली आकाशी । तिणे गिळिले सूर्याशी ।
थोर नवलाव जाला । वांझे पुत्र प्रसवला ।
विंचू पाताळाशी जाय । शेष माथा बंदी पाय ।
माशी व्याली घार झाली । देखोन मुक्ताई हासली ।।" ५३
मुक्ताबाईचे असे एकाहून एक लोकविलक्षण अनुभव ऐकून आजूबाजूची
शिष्यमंडळी स्तिमित होऊन जात असत. आध्यात्मिक अवस्थेच्या दृष्टीने
तिच्यापेक्षा निम्न अवस्थेत असणारी ही मंडळी तिच्या अवस्थेचा मनाने अंदाज
बांधत असत. ही सारी मंडळी मुक्ताबाई आणि चांगदेव यांच्यातील संवाद
३६<noinclude></noinclude>
hu1de9qaaeeokexsypur697nx14nf0l
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३८
104
110299
229832
2026-05-06T17:04:40Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कानात प्राण आणून ऐकत बसत. प्रसन्न मनःस्थितीत असलेली मुक्ताबाई कधी चांगदेवाला कोड्यातही टाकत असे. "टेकावरी टेक त्यावरी टेकुली । तेथे एक बाळी विस्मो करी । तिचे नाव काय त्याचे नाव क..."
229832
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>कानात प्राण आणून ऐकत बसत. प्रसन्न मनःस्थितीत असलेली मुक्ताबाई कधी
चांगदेवाला कोड्यातही टाकत असे.
"टेकावरी टेक त्यावरी टेकुली । तेथे एक बाळी विस्मो करी ।
तिचे नाव काय त्याचे नाव काय । विचारोनि पाहे मनामाजी ।
डोळियांतील बाहुली जालिसे गरुवारु । तिशी सुईण मेळवा अरुवारु ।
सुईचे आणीवर रचिले पाठार । मुक्ताई म्हणे चांगया सांग याचा विचार ।। " ५४
मुक्ताबाईच्या सहवासात असलेल्या शिष्यांना रोजच असे काहीना काही नवे
प्रबोधनपर असे ऐकावयास मिळत असे. असेच कित्येक दिवस निघून गेले.
इकडे नामदेव आणि ज्ञानेश्वर तीर्थयात्रा करून पुन्हा पंढरपूरास आले.
निवृत्ति, सोपान, विसोबा खेचर, नरहरी सोनार, गोराकुंभार, चोखामेळा
इत्यादींच्या समवेत तीर्थयात्रेचे उद्यापनही झाले. तीर्थयात्रेतील अनुभव
यानिमित्ताने ज्ञानेश्वरांनी साऱ्यांना कथन केले. ज्ञानेश्वर तेथे उपस्थित असलेल्या
वारकऱ्यांना सांगत होते,
" नलगे तीर्थाटन काया क्लेश जाण । नलगे अनुष्ठान करणे बहु ।
साधनावाचुनी मार्ग सोपा जाण । करावे कीर्तन रामकृष्ण ।
सर्वकाळ कथा संतांची संगती । वाचे नाम कीर्ति सर्वकाळ ।
तो हा राजमार्ग सर्वांहोनी चांग । सदा संतसंग वाचे नाम ।। " ५५
वारकरी संप्रदायाची एक सुनिश्चित अशी व्यवस्थाच जणू याप्रसंगी ज्ञानेश्वरांनी
लावून दिली.
हा सारा आनंदकल्लोळ चालू असतानाच, ज्ञानेश्वरांनी आपण समाधि
घेणार असल्याचा आपला निर्णय बोलून दाखविला. साऱ्यांनाच या गोष्टीचे अपार
दुःख झाले. ज्ञानेश्वर, नामदेव आदी सारी मंडळी ज्ञानेश्वरांच्या समाधिसाठी
म्हणून आळंदीला परतली. आळंदीला जाण्यापूर्वी ही सारी जण आळंदीपासून
पाच कोसावर असलेल्या सोळू या गावी थांबली; जेथे मुक्ताबाई, चांगदेव ही
मंडळी वास्तव्य करून होती.
"पंढरीचा पोहा आला अलंकापुरी । पंच कोसावरी साधुजन ।
पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार । दिंड्या ते बाहेर निघाल्यासे ।
पताकांचे भार निघाले बाहेर भेटती ऋषीश्वर पांडुरंगा |
३७<noinclude></noinclude>
2a0lgwyrk3i1qmkwaz7j4hjq3pddszk
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/३९
104
110300
229833
2026-05-06T17:04:56Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "अवधिया भेटी झाल्या त्या बाहेरी । मग अलंकापुरी येते झाले ।। " ५६ असे या प्रसंगाचे वर्णन नामदेवांनी केले आहे. मुक्ताबाईलाही ज्ञानेश्वरांचा समाधिचा निर्णय ज्ञात झाला. तो ऐकून तिचे च..."
229833
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>अवधिया भेटी झाल्या त्या बाहेरी । मग अलंकापुरी येते झाले ।। " ५६
असे या प्रसंगाचे वर्णन नामदेवांनी केले आहे. मुक्ताबाईलाही ज्ञानेश्वरांचा
समाधिचा निर्णय ज्ञात झाला. तो ऐकून तिचे चित्त विकल झाले. 'आवरली माया
पुरातन आपुली' ५७ ही गोष्ट ज्ञानेश्वरांच्या समाधिच्या निर्णयाने निवृत्ति,
मुक्ताबाई, सोपान यांना कळून चुकली. आपले अवतारकार्य संपत आल्याची ही
सूचना होती. 'मार्ग हा मोकळा आम्हा झाला' ५८ ही उरलेल्या तिघांची
त्यामागची भूमिका होती.
ज्ञानेश्वरांच्या समाधिप्रसंगी ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाची स्तुती आरंभली.
त्यानंतर निवृत्ति, सोपान यांनीही तसेच केले. मुक्ताबाई विठ्ठलाला म्हणाली,
" सत्य सत्य जनार्दन । सत्य सत्य नारायण ।
सत्य सत्य आमुचे तू धन । जगज्जीवन जगदाकार ।
तुजवाचोनी त्रिभुवनी । दुजा न देखो नायको कानी ।
वेद शास्त्र पुराणी । अगाध महिमा तुझा ।
तू देवाधिदेवो उत्तम । तू निजभक्तांचा विश्राम ।
तू शंकराचा आत्माराम । ऐसा नेम वेदाचा ।
तरी भक्तांचा कोंवसा पावसी तू हृषीकेशा ।
तू
नाही तुजवीण भरवसा | निश्चय ऐसा साच तू ।
तू परत्रीचे तारू । तुझा आगम निगम विचारु ।
तुझ्या चिंतने पारु । उतरे संसार दुर्घट | "
अशा प्रकारे मुक्ताबाईने विठ्ठलाची स्तुती करून त्याचे चरण वंदिले. तेव्हा
पांडुरंग प्रसन्न होऊन तिला म्हणाले, “मन समर्पिले माझे ठायी । तयासी
जन्ममरण नाही ।।” ५९ याचप्रसंगी मुक्ताबाईच्या समाधिविषयी पांडुरंगाने कथन
केले ते असे की,
"तरी नाथाचा हात ईचा शिरी । यालागी ते सत्यसनातन अवधारी ।
महाकल्पाचा अवश्वरी । हे सोडील देह ।
तववरी तिचे शरीर । अभंग चिरकाळ निरंतर ।
महमाया योगिणी साचार । मुक्ताबाई उद्धवा ||" ६०
यानंतर मग प्रत्यक्षात अत्यंत अवघड प्रसंग येऊन ठेपला. ज्ञानेश्वरांची समाधिची
३८<noinclude></noinclude>
m3pfvdv7d2qqexb5e3zedgeisu7w6fc
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/४०
104
110301
229834
2026-05-06T17:05:06Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "वेळ जवळ येत चालली होती. निवृत्तिनाथ, मुक्ताबाई, सोपान यांच्या मनात ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाची आठवण जागी होत होती. 'छळिले ब्राह्मणे प्रतिष्ठानी जाता। रेड्यामुखी वेदांता बोला..."
229834
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>वेळ जवळ येत चालली होती. निवृत्तिनाथ, मुक्ताबाई, सोपान यांच्या मनात
ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाची आठवण जागी होत होती. 'छळिले ब्राह्मणे प्रतिष्ठानी
जाता। रेड्यामुखी वेदांता बोलाविले ॥ आला चांगदेव व्याघ्र वहान घेऊन ।
नेला अभिमान ज्ञानेदेवे ।।' ६१ अशा आठवणी निघत होत्या.
मातापित्यांच्या निर्याणाच्या वेळी मुक्ताबाई वयाने लहान होती. तेव्हा
मातापित्यांच्याप्रमाणे तिचा सांभाळ निवृत्ति - ज्ञानेश्वरांनी केला होता. आता
ज्ञानेश्वर समाधिस्थ होणार हे पाहून तिला विलक्षण दुःख दाटून आले. “आम्हा
मातापिता नित्य ज्ञानेश्वर । नाही आता धार विश्रांतीसी ।।" ६२ अशी
मुक्ताबाईची त्यावरची प्रतिक्रिया होती.
चौघा भावंडांची आता ताटातूट होणार होती. निवृत्तिनाथांना
यानिमित्ताने चौघांचे जीवन आठवत होते. ते आठवून ते म्हणाले,
" त्रिवेणीचा ओघ जैसा एकेठायी । तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये ।
ब्रह्माविष्णूहर जैसे एकेठायी । तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये ।
रज तम गुण सत्व गुणाठायी । तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये ।
भूचरी खेचरी चाचरी ते पाही । अगोचरी ठायी मुक्तगंगा ।। ६३
निवृत्तिनाथांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न इतर संतजन करीत होते परंतु त्यांचे मन
काही केले तरी शांत होत नव्हते. आईवडिलांनी या भावंडांचा त्याग केला तेव्हाही
झाले नाही एवढे दुःख निवृत्तिनाथांना याप्रसंगी होत होते.
ज्ञानेश्वर समाधिस्थ झाले. आता आपलेही या भूलोकातील कार्य संपले
आहे, तेव्हा आता आपणही हा देह रक्षू नये अशी मुक्ताबाईच्या मनाची अवस्था
झाली. तेव्हा पांडुरंगाने तिला सांगितले, “सोपान जाईपर्यंत स्थिर असा. "
मुक्ताबाईनीही ती गोष्ट मान्य केली. ज्ञानेश्वरांच्या समाधिदिनानंतर सारी जण तेथे
नऊ दिवसपर्यंत राहिली.
ज्ञानेश्वरांच्या समाधिनंतर निवृत्तिनाथ, मुक्ताबाई व सोपानदेव आणि
इतर शिष्यवर्ग कौंडण्यपूर या गावी अंबिकेची सेवा करण्याच्या हेतूने राहिले. नंतर
ही सारी मंडळी सासवड येथे आली. सोपानदेव आणि वटेश्वर यांच्या समाधिचे हे
स्थळ नेमलेले होते. समाधि घेण्यापूर्वी हे दोघेही जण निवृत्तिनाथ व मुक्ताबाई
यांच्या जवळ आले. या दोघांनी निवृत्तिनाथांना वंदन केले. मुक्ताबाईने या
३९<noinclude></noinclude>
g93mjbhkjrz0l9cgan6mxc8rgv9ad40
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/४१
104
110302
229835
2026-05-06T17:05:20Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दोघांची अवस्था ओळखून म्हटले, "म्हणे मुक्ताबाई जाती दोघेजण । ऐसे नारायणे बुझाविले ।।" ६४ या दोघांचे परमेश्वराशी झालेले ऐक्य मुक्ताबाई पाहू शकत होती. विसोबा खेचर, निवृत्ति, मुक्ताब..."
229835
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>दोघांची अवस्था ओळखून म्हटले, "म्हणे मुक्ताबाई जाती दोघेजण । ऐसे
नारायणे बुझाविले ।।" ६४ या दोघांचे परमेश्वराशी झालेले ऐक्य मुक्ताबाई पाहू
शकत होती.
विसोबा खेचर, निवृत्ति, मुक्ताबाई, परीसा भागवत, चांगदेव आदी सारी
मंडळी शोक करू लागली. निवृत्ति, मुक्ताबाई यांच्या तोंडून एक शब्दही बाहेर
पडू नये इतके ते दुःखातिशयाने व्याकुळ झाले होते. सोपानदेवांनी हे पाहिले
आणि त्यांचे सांत्वन करावे या हेतूने ते निवृत्तिनाथांना म्हणाले, "मुक्ताबाई सखी
तुम्हापाशी" ६५ सोपान व वटेश्वर समाधिस्थ झाले. समाधिची शिळा घातली.
निवृत्ति, मुक्ताबाई यांनी समाधिस वंदन केले आणि त्यांची देहभान शुद्धीच
हरपली. त्रयोदशी ते अमावस्या या दिवसामध्ये त्या साऱ्यांनी मिळून तेथे
भजनकीर्तन केले.
वटेश्वरांच्या समाधिस्थ होण्यानंतर चांगदेवांनीही आपली समाधी
घेण्याची इच्छा बोलून दाखविली. गोदातीरावर जाण्याच्या उद्देशाने निवृत्ति,
मुक्ताबाई, चांगदेव ही मंडळी प्रतिपदेच्या दिवशी बाहेर पडली.
मजलदरमजल करत करत ही सारी मंडळी भुलेश्वरास आली. तेथे तीन
दिवसपर्यंत राहिली. भुलेश्वराची यथासांग पूजाअर्चा केली. सिद्धेश्वरास जाऊन
सारी जण कपिलेश्वर येथे आली. दहा दिवसपर्यंत सारी तेथेच राहिली.
पुढे सगळा पौष महिना त्यांनी कचेश्वर येथे घालविला. माघ
महिन्याच्या प्रतिपदेस निघून पुणतांबे येथे आल्यावर पौर्णिमेपर्यंत ते तेथेच राहिले.
दशमीपासून चांगदेवांच्या समाधिचे वेध साऱ्यांना लागले. गोदातीरावर
हा सारा समारंभ चालू होता, भजनकीर्तन यात दिवस जात होते. सर्व
समुदायाबरोबर निवृत्तिनाथ, मुक्ताबाई आता मंडपात आले. चांगदेवांनी त्या
दोघांना नमस्कार केला. आपल्या सान्या आयुष्याचा जीवनपटच जणू
चांगदेवांच्या डोळ्यांसमोरून सरकत होता. चवदाशे वर्ष शरीरधारण करूनही न
गेलेले अज्ञान, अहंकार, अभिमान या सान्यासाऱ्याची उजळणी जणूकाही होत
होती. आपल्या पातकांचा काही अंतच नाही असे त्यांचे अंतर्मन त्यांना सांगत
होते. पश्चातापाने त्यांचे मन जणू पेटून उठले होते. तेव्हा " योगीराज यास नाही
पापदोष ॥ केला उपदेश मुक्ताईने ।। ६६ चांगदेवाला मुक्ताबाईने उपदेश
४०<noinclude></noinclude>
2zq8zd9oym1r8i3ovrfyopy2v874sq1
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/४२
104
110303
229836
2026-05-06T17:05:27Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "केलेला असल्याने त्याला आता पापदोष लागत नाही असे नामदेवांना वाटत होते. मुक्ताबाईबद्दलची कृतज्ञतेची भावना चांगदेवांच्या मनात आता दाटून आली. "कृपावंत झाली मुक्ताबाई जेव्हा । स्व..."
229836
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>केलेला असल्याने त्याला आता पापदोष लागत नाही असे नामदेवांना वाटत होते.
मुक्ताबाईबद्दलची कृतज्ञतेची भावना चांगदेवांच्या मनात आता दाटून
आली.
"कृपावंत झाली मुक्ताबाई जेव्हा । स्वरूप दिशा दाही दाखविले ।
पाठी पोटी स्वरूप केले सद्गुरुने । तव अभिमान गेला माझा ।
याच्या उपकाराची काय वर्णू थोरी ज्यांच्या संगे हरी जोडियेला ।। " ६७
अशा प्रकारे चांगदेव सद्गुरु मुक्ताबाईंचे वर्णन करू लागले. मुक्ताबाई आणि
निवृत्तिनाथ यांची पूजा चांगदेवांनी केली. " नमो सद्गुरु मुक्ताबाई | नमो
स्वस्वरूप ठायी । नमो वंदितसे पायी । नमो नमो परमपद ।।" ६८ असे म्हणून
चांगदेवांनी मुक्ताबाईस नमन केले. मुक्ताबाईंचे डोळे ओसंडले. तिने न राहवून
चांगदेवांना पोटाशी घेतले. नंतर चांगदेव समाधिस्थ झाले तेव्हा निवृत्तिनाथ
म्हणाले,
'आता मुक्ताबाई जाईल की ।।" ६९ वद्य त्रयोदशीला चांगदेव
समाधिस्थ झाल्यानंतर फाल्गुन शुद्ध पंचमीपर्यंत सारे जण तेथेच राहिले आणि
नंतर तेथून नेवासे या गावी जाण्यासाठी त्यांनी प्रस्थान ठेवले.
नेवासे येथे दहा दिवसपर्यंत वास्तव्य केले. तेथून पुढे टोकेश्वरतीर्थावर
गेले. निवृत्तिनाथांच्या सांगण्यावरून नंतर सारे जण प्रतिष्ठानी (पैठण) आले. या
चौघा भावंडांची मायभूमी असलेल्या आपेगावी जाण्याची इच्छा नामदेवांच्या
मनात निर्माण झाली. तेव्हा त्यासाठी म्हणून ते आपेगावी गेले. आपल्या मूळ
गावी परत आल्यावर निवृत्ति आणि मुक्ताबाई दोघांच्याही मनात बालपणीच्या
आठवणी जाग्या झाल्या.
'तात आणि मात गेलीसे येथून । तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा ।
निवृत्ति ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न । सांभाळी सोपान मजलागी ।
तुझ्या योगे हरि क्रमियेले काळा ॥'
अशा आठवणींनी मुक्ताबाईंचे डोळे भरून आले. आता मात्र यातले निवृत्ति
आणि आपणच राहिलो आहोत हे लक्षात येऊन ती पुढे म्हणाली, “फुटलासे
मेळा तापसांचा ॥" ७०
शिवरात्रीसाठी वेरुळला, घृष्णेश्वराला जाण्याच्या हेतूने दशमीच्या
दिवशी सारे जण जाण्यास निघाले. मुक्ताबाई आता दिवसेंदिवस उदास होत
४१<noinclude></noinclude>
lxbmnfemulwff522zgg9dpsppshn0lu
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/४३
104
110304
229837
2026-05-06T17:07:06Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "चालली होती. आता हे शरीर रक्षू नये अशी इच्छा प्रबळ झाली होती. त्या प्रेरणेतूनच आता तिने अन्नपाण्याचाही त्याग केला होता. निवृत्तिनाथ मात्र तिची ही अवस्था पाहून मनातल्या मनात तळमळत..."
229837
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>चालली होती. आता हे शरीर रक्षू नये अशी इच्छा प्रबळ झाली होती. त्या
प्रेरणेतूनच आता तिने अन्नपाण्याचाही त्याग केला होता. निवृत्तिनाथ मात्र तिची
ही अवस्था पाहून मनातल्या मनात तळमळत होते.
वेरुळची यात्रा यथासांग झाली, मात्र मुक्ताबाई काही देहभानावर
नव्हती. स्वरुपामध्ये निमग्न होती. गोरक्षनाथकृपेच्या वेळी जो अनुभव तिला
आला होता त्याच्या आधारावर ती आता वेगाने आध्यात्मिक मार्गक्रमण करत
होती. निवृत्तिनाथही आपल्याला आलेला तो दिव्य अनुभव पुन्हा यावा म्हणून
तळमळत होते. मुक्ताबाईने ज्या साधनेच्या आधारे गोरक्षनाथांची कृपा संपादन
केली होती, तो साधनामार्ग आपल्यालाही मिळावा म्हणून ते व्याकुळ झाले होते.
अत्यंत आर्ततेने ते मुक्ताबाईची विनवणी करत होते. पण मुक्ताबाई आपली
मौन्यमुद्रा सोडण्यास तयार होत नव्हती. अखेर निवृत्तिनाथांनी केलेल्या दीर्घकाळ
विनवणी नंतर तिने उत्तर द्यावयास सुरुवात केली. यातूनच 'ज्ञानबोध' या ग्रंथाची
निर्मिती झाली. ७१
मुक्ताबाईची दिवसेंदिवस वाढत चाललेली आत्ममग्न अवस्था पाहून
एक दिवस निवृत्तिनाथांनी "गमन कोणे दिवशी आरंभिले" ७२ असा प्रश्न
मुक्ताबाईस केला. तेव्हा मुक्ताबाईंने उत्तर दिले,
"जावे यावे कोठे अवघे निघोट स्वरूप स्वामी ।
1
आमुच्या स्वस्थानी नाही पा अंधार । अवघी चराचर प्रकाशत्वे ।
उदय आणि अस्तु नाही स्वरुपासी। ऐसे मुनी ऋषी जाणताती ।
आम्ही कधी आलो स्वरूप सोडोन । जावे पालटोन जेथिल तेथे ।
अंतर बाहेर स्वामीचे स्वरूप । स्वये नंदादीप उजळिलो ।।" ७३
मुक्ताबाईची ही उच्च आध्यात्मिक अवस्था पाहून निवृत्तिनाथ समाधानी झाले.
मुक्ताबाईला जपावे म्हणून निवृत्तिनाथ साऱ्यांना विनवत होते.
निवृत्तिनाथ मुक्ताबाईचा हात धरून तिला जपून चालवित नेत होते. चालत
चालत सारे जण आता तापी तीरावर आले. इतरत्र सर्वत्र वैशाख वणवा पेटलेला
असताना महत्ग्राम मात्र वृक्षराजींमुळे शांत वाटत होते. मार्कंडेय ऋषींनी
तपश्चर्या केलेले ते स्थान अतिशयच रमणीय होते.
वैशाख महिन्यातील वद्य दशमी. सारे जण नेहमीप्रमाणे तापीतीरावर
४२<noinclude></noinclude>
kwndv4hkddncr2fh9kei4ujdaw9ireg
पान:कडकडोनि वीज निमाली ठायीचे ठायी.pdf/४४
104
110305
229838
2026-05-06T17:07:17Z
QueerEcofeminist
918
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "स्नानासाठी गेले. साऱ्यांनी स्नान केले आणि भजनसंकीर्तन करावे ह्या हेतूने ते तापीतीरावर आले. टाळविणा, मृदंग यांच्या कल्लोळामध्ये सारेजण जणू देहभान हरपले होते. तापसांच्या मेळ्या..."
229838
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>स्नानासाठी गेले. साऱ्यांनी स्नान केले आणि भजनसंकीर्तन करावे ह्या हेतूने ते
तापीतीरावर आले. टाळविणा, मृदंग यांच्या कल्लोळामध्ये सारेजण जणू देहभान
हरपले होते. तापसांच्या मेळ्यातील ज्ञानेश्वर, सोपानदेव, वटेश्वर, चांगदेव हे
केव्हाच समाधिस्थ झाले होते. या साऱ्यांच्या आठवांनी साऱ्यांचीच मने
एकप्रकारे कातर अशी झाली होती आणि त्यामुळे भजनामध्येही एक विलक्षण
आर्तता निर्माण झाली होती.
सकाळपासून नामगजरामध्ये दंग असणाऱ्या या मंडळींना मध्यान्ह कधी
झाली हेही कळले नाही. आता मात्र वातावरणात अचानक बदल घडून आला.
भर दुपारीच आकाशात मेघांनी गर्दी केली. प्रलयकाळच्या वीजांप्रमाणे विजा
चमकू लागल्या. प्रचंड वारा सुटला, वाऱ्याच्या वेगामुळे धूळ गगनापर्यंत जाऊ
लागली. समोरचे काहीच दिसेनासे झाले, अंधकार दाटून आला. वाऱ्याच्या
प्रचंड वेगामुळे साऱ्यांच्याच देहलता विलक्षण रीतीने थरथरत होत्या. वारा,
वादळ, पाऊस, वीजा यांचे जणू काही तांडवनृत्यच सुरु झाले होते. पृथ्वी आणि
गगन एकमेकांत मिसळून गेल्यासारखे भासत होते. या साऱ्या प्रकारामुळे
कोणालाच काही दिसत नव्हते. कोणाचेच डोळे उघडत नव्हते अशी काही
विलक्षण परिस्थिती निर्माण झाली होती. देहदृष्ट्या अत्यंत विकल झालेल्या
मुक्ताबाईची अवस्था आता अधिकच बिकट असणार हे जाणून निवृत्तिनाथ
मुक्ताबाईला धरून ठेवा म्हणून इतरांना विनवत होते. त्यांचे ते शब्द
वादळवान्यातच विरून गेले.
वीजेचा विलक्षण असा कडकडाट चालू असतानाच मध्ये एकदम घंटा
वाजत असल्याचे नाद सर्वांच्या कानी आले. परंतु नेमके काय घडत आहे हे
कोणालाच कळत नसल्याने त्या घंटानादाचाही काही अर्थबोध कोणाला झाला
नाही. काही वेळाने आकाश आभुट निवारले गेले, मळभ निघून गेले, आकाश
पुन्हा पूर्ववत स्वच्छ झाले. वारावादळवीजा यांचे तांडवनृत्य थांबले, तेव्हा
साऱ्यांनीच डोळे उघडले. आपल्या अवतीभोवती काय झाले आहे यादृष्टीने सारे
पाहू लागले. निवृत्तिनाथांनी पहिला प्रश्न केला तो मुक्ताबाईसंबंधी. ती कोठे
आहे याची विचारणा केली. साऱ्यांनी इकडे तिकडे पाहिले, परंतु खूप शोधाशोध
करूनही मुक्ताबाई कोठे सापडली नाही. "मुक्ताबाई डोळा पाहिली नाही ।
४३<noinclude></noinclude>
dmszrurbphklarp60rn0wzwu0krq7k4