विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.1 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:जपानचा इतिहास.pdf/५ 104 96373 229904 194437 2026-05-08T12:05:48Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 229904 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''जपान.'''}}}} {{center|{{bar|2}}○{{bar|2}}}}  {| |+ |- | '''प्रकरण १ लें{{bar|1}}''' || विषयप्रवेश. || १ |- | '''प्रकरण २ रें{{bar|1}}''' || जपानचा विस्तार वगैरे. || ४ |- | '''प्रकरण ३ रें{{bar|1}}''' || जपानामध्ये अति प्राचीन काळापासून राहणारे ऐनो || १९ |- | '''प्रकरण ४ थें{{bar|1}}''' || आपल्या उत्पत्तीविषयी जपानी लोक काय ह्मणतात? || २५ |- | '''प्रकरण ५ वें{{bar|1}}''' || वास्तविक जपानी लोक आले कोठून? आहेत कोण? || २९ |- | '''प्रकरण ६ वें{{bar|1}}''' || जपानी लोकांचे पोषाक || ३४ |- | '''प्रकरण ७ वें{{bar|1}}''' || जपानी लोकांची घरें. || ४१ |- | '''प्रकरण ८ वें{{bar|1}}''' || जपानी लोक अन्न कोणत्या प्रकारचें खातात? || ४७ |- | '''प्रकरण ९ वें{{bar|1}}''' || जपानी लोकांचे लग्नसंस्कार || ५० |- | '''प्रकरण १० वें{{bar|1}}''' || जपानी लोकांची मुले. || ५४ |- | '''प्रकरण ११ वें{{bar|1}}''' || जपानी लोकांची भाषा व वाङमय. || ५९ |- | '''प्रकरण १२ वें{{bar|1}}''' || जपानी लोकांची शिक्षणपद्धति. || ६६ |- | '''प्रकरण १३ वें{{bar|1}}''' || जपानी लोकांचें जात वर्ग || ७० |- | '''प्रकरण १४ वें{{bar|1}}''' || जपानांतील धंदे. || ७६ |- | '''प्रकरण १५ वें{{bar|1}}''' || जपान लोकांची प्रवासपद्धति. || ७९ |- | '''प्रकरण १६ वें{{bar|1}}''' || कांहीं जपानी चाली. || ८२ |- | '''प्रकरण १७ वें{{bar|1}}''' || जपानी राज्यभार कसा चालतो. || ८८ |- | '''प्रकरण १८ वें{{bar|1}}''' || जपानांतील कायदा कोणत्या पद्धतीवर आहे? || १०७ |- | '''प्रकरण १९ वें{{bar|1}}''' || जपानांतील लष्कर व आरमार. || १०९ |- | '''प्रकरण २० वें{{bar|1}}''' || जपानांतील व्यापार. || १११ |- | '''प्रकरण २१ वें{{bar|1}}''' || जपानांतील धर्म. || ११३ |- | '''प्रकरण २२ वें{{bar|1}}''' || जपानांतील मुख्य शहरें. || १२४ |- | '''प्रकरण २३ वें{{bar|1}}''' || जपानी लोकांपासून घेण्याचा बोध. || १२९ |}
{{rule|7em}} {{nop}}<noinclude></noinclude> dju1bebpdlbzltqrv11wla14m7u9qou पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१४ 104 109994 229905 229015 2026-05-08T15:33:47Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229905 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले."
{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता.
{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई ॲम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता.
{{gap}}हे झाले लढाईतील धैर्याचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:-
{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आर्जीनौझी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-<noinclude>{{center|८}}</noinclude> n8lyycxanporzw95zi165rmemtj9t78 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१५ 104 109995 229906 229014 2026-05-08T15:36:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229906 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>वरील खलाशांचा तपास करण्याकडे व विशेषतः मेलेल्यांची प्रेतें उत्तर कार्याकरितां घरी आणण्याच्या कामांकडे काणाडोळा केला. अथीनीयन लोक प्रेताचे उत्तर कार्य करणें हें फार पवित्र कर्तव्यकर्म समजत असत. विजयी सेनापतीच्या हयगयीमुळे व कर्तव्यपराङ्मुतेमुळे आपले पुषकळ नातलग गमावले व विशेषतः मृतांचा धार्मिक प्रेतसंस्कार करणे अशक्य झालें हें पाहून अथीनीयन जनता खवळली व कांही लोकांनी लोकसभेत सेनापतीवर कर्तव्यकसूरीबद्दल आरोप आणला. फार मोठं वादळ झालें होतें म्हणून त्या वेळीं माणसें पाठविणें म्हणजे त्यांचेच जीव धोक्यांत घालण्यासारखे होतें, असें एकदां त्यांच्या बाजूनें सांगण्यांत आलें, तर दुसऱ्यांदा ही कामगिरी दोन कामगारांकडे सोपविली होती परंतु त्यांनी कामचुकारपणा केला म्हणून त्यावर उलट आरोप सेनापतीच्या तर्फे करण्यांत आला. तरी अथीनीयन लोक शांतपणे ऐकून घेत होते व त्यांच्यावरील आरोपाचा विचार न्यायसभेत करण्याचे ठरले होते; परंतु इतक्यांत एक अथेन्समधील सांवत्सरिक कौटुंबिक समारंभ झाला व त्या वेळी किती तरी कुटुंबांतील किती तरी कर्ते पुरुष नाहींसे झालेले आहेत असे दिसून आले. लोकांचा क्षोभ व्हावा म्हणून काहीजण सुतकाचा पोषख करून या समारंभांत आले होते. या सर्व देखाव्यानें लोकांच्या मनाचा क्षोभ झाला व पहिले पारडे फिरले व न्यायासनासमोर न नेता सर्व सेनापतींच्या वरील आरोपाचा एकदम व एका लोकसभेतील बहुमतानें निकाल करावा, अशी सूचना सभेपुढे आली. आळीपाळीने एकएका गोत्रांतील अध्यक्ष करण्याच्या रीतीप्रमाणे सॉक्रेटिसाची अध्यक्षाची पाळी त्या दिवशी आली होती. ही सूचना उघड उघड गैरकायदा होती. अशी गैरकायदा सूचना मी साफ सभेपुढे ठेवणार नाहीं, असें सॉक्रेटिसाने निक्षून सांगितले: त्याला लांच देऊं केला, मरणाचें भय घातले, नाना प्रकारांनी विनवण्या केल्या. लोक अगदी खवळलेले होते. तरीसुद्धां सॉक्रेटीस डगमगला नाहीं किंवा सत्यापासून पराङ्मुख झाला नाहीं. सॉक्रेटिसाच्या या नीतिधैर्यांचा<noinclude>{{center|९}}</noinclude> mfzhncvnaknoqu4oju2xdvm8mmeggww पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१६ 104 110000 229907 229012 2026-05-08T15:39:29Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229907 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्याप्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवसपर्यंत हें काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनीं आपली सूचना दुसऱ्या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली.
{{gap}}आतां अशा तऱ्हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सॅलॅमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितलें. या जुलमी अधिकाऱ्यांचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचांमध्ये सॉक्रेटीस होता. असे अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाहीं, असें सांगून सॉक्रेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणाबद्दल त्या जुलमी अधिकाऱ्यांनी सॉक्रेटिसावर कड्याळ आणले असतें, परंतु असें करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधून उचलबांगडी झाली.

{{center|******}}{{nop}}<noinclude>{{center|१० }}</noinclude> fzo63af2cm33dxt48h7h9bw9tqwlj6g 229911 229907 2026-05-08T15:44:10Z कल्पनाशक्ती 3813 229911 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्याप्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवसपर्यंत हें काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनीं आपली सूचना दुसऱ्या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली.
{{gap}}आतां अशा तऱ्हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सॅलॅमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितलें. या जुलमी अधिकाऱ्यांचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचांमध्ये सॉक्रेटीस होता. असे अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाहीं, असें सांगून सॉक्रेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणाबद्दल त्या जुलमी अधिकाऱ्यांनी सॉक्रेटिसावर कड्याळ आणले असतें, परंतु असें करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधून उचलबांगडी झाली.

{{rule|7em}}{{nop}}<noinclude>{{center|१० }}</noinclude> 43ccw7d455msztj66djft62g27bgd6w पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१७ 104 110001 229908 228878 2026-05-08T15:42:35Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229908 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|'''( २ )'''}} {{center|{{x-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}} {{center|********}}
{{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझरी सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणाऱ्या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.
{{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस<noinclude>{{center|११}}</noinclude> rasaogpg3dpc0cdpebxe29l2by2pch5 229909 229908 2026-05-08T15:42:54Z कल्पनाशक्ती 3813 229909 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|'''( २ )'''}} {{center|{{x-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}} {{center|********}} {{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझरी सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणाऱ्या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.
{{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस<noinclude>{{center|११}}</noinclude> pph6wywsp042eeyym8c2831ba5qh715 229910 229909 2026-05-08T15:43:38Z कल्पनाशक्ती 3813 229910 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|'''( २ )'''}} {{center|{{x-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}} {{rule|9em}} {{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझरी सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणाऱ्या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.
{{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस<noinclude>{{center|११}}</noinclude> 3785lfu4zoctg8lhbojmjenx9lcna61 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१८ 104 110002 229912 229009 2026-05-08T15:48:21Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229912 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषयी भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें जनतेचे वर्तनतत्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर खऱ्या साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असते; खऱ्या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; खऱ्या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुसऱ्याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखविण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं परंतु दुसऱ्याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धां दिसतें! शेवटीं खऱ्या साधुपुरुषाला थोतांड व दांभिकपणा मुळींच खपत नाहीं, त्याला दुसऱ्याचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाहीं व त्याला खोटीं स्तुति करतां येत नाहीं; तर जनतेची धर्मथोतांडबंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणें वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुतिप्रिय असते. विशेषतः खऱ्या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यास त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धां करण्यास मागें पुढे पहात नाहींत.
{{gap}}साक्रेटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली. त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती हे पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपानें उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचें अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून त्याच्या जवळून सत्यरूप उत्तरें काढून त्याला उपदेश करी. हा सर्व<noinclude>{{center|१२}}</noinclude> 31i4s3r4aga617n4f1l09prwund28d2 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१९ 104 110003 229913 229008 2026-05-08T15:50:59Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229913 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वदेखत आपली फजिती झालेली खपत नसे. त्यामुळे सर्व धंद्याच्या लोकांचे साक्रेटिसानें वैर संपादन केले होते. शिवाय, साक्रेटिस हा मोठा सुधारणावादी होता, व प्रत्येक चालीचे, प्रत्येक संस्थेचें, प्रत्येक मताचे व प्रचलित कल्पनेच युक्तिवादाने समर्थन करतां आलें तर तो खरी असे तो म्हणत असे. यामुळे पुराणमताभिमानी लोकांचेहि त्याने वैर संपादन केलें होतें. याप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्याविरुद्ध वैराचा अग्नि सारखा धुमसत होता व त्याचा भडका अथेन्समध्ये जुलमी तीस अधिकाऱ्यांची सत्ता जाऊन पुनः प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाल्याबरोबर झाला. या जुलमी अधिकाऱ्यांच्यामध्ये कांहीं साक्रेटिसाचे शिष्य होते. यामुळे तर लोकक्षोभांत जास्तच भर पडण्यास कारण झाले. अथेन्सला भोगाव्या लागलेल्या सर्व आपत्तींचे आदिकारण सॉक्रेटिस चें शिक्षण, अशी लोकांची समजूत झाली. तेव्हां हें मूळच नाहीसे करून टाकले पाहिजे असे कित्येकांस वाटून त्यांनीं साक्रेटिसावर फौजदारी खटला करून त्याचा अंत करण्याचा निश्चय केला व तो अथेन्समधल्या न्यायपद्धतीमुळे त्यांना सहज पार पाडता आला.
{{gap}}अथेन्समधील न्यायपद्धतीची हल्लीच्या काळच्या लोकांना मुळींच कल्पना यावयाची नाही. अथेन्सच्या राजकीय सत्तेप्रमाणेच अथेन्सची न्यायपद्धतीही पूर्ण लोकसत्तात्मक होती. तेथे आधी लिहिलेले असे कायदे नसत, निष्णात न्यायाधीशही नसत, सामान्य लोकांची ज्यूरी असे. परंतु ही ज्यूरी इंग्रजी पद्धतीप्रमाणे न्यायाधीशास सल्ला देण्यापुरतीच नसे, तर सर्व न्यायाचे अधिकार ज्यूररच्या मताधिक्यावर अवलंबून असत व ज्यूररची संख्याही फारच मोठी असे. म्हणून अथेन्समधील न्यायसभा ही लोकसभेप्रमाणे सर्व नागरिकांची सभाच असे. वादीप्रतिवादींनी आपापले खटले स्वतःच चालविले पाहिजेत असाही दुसरा एक नियम असे. न्यायसभेच्या अशा घटनेमुळे खटले वादीप्रतिवादींनी स्वतःच चालविण्याच्या नियमाने व कारभाराच्या पूर्ण लोकतत्वामुळे ग्रीस देशांत वक्तृत्व<noinclude>{{center|१३}}</noinclude> b3hsapx11fxqovrytb194mqgc2a5ncf 229914 229913 2026-05-08T15:51:35Z कल्पनाशक्ती 3813 229914 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वदेखत आपली फजिती झालेली खपत नसे. त्यामुळे सर्व धंद्याच्या लोकांचे साक्रेटिसानें वैर संपादन केले होते. शिवाय, साक्रेटिस हा मोठा सुधारणावादी होता, व प्रत्येक चालीचे, प्रत्येक संस्थेचें, प्रत्येक मताचे व प्रचलित कल्पनेच युक्तिवादाने समर्थन करतां आलें तर तो खरी असे तो म्हणत असे. यामुळे पुराणमताभिमानी लोकांचेहि त्याने वैर संपादन केलें होतें. याप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्याविरुद्ध वैराचा अग्नि सारखा धुमसत होता व त्याचा भडका अथेन्समध्ये जुलमी तीस अधिकाऱ्यांची सत्ता जाऊन पुनः प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाल्याबरोबर झाला. या जुलमी अधिकाऱ्यांच्यामध्ये कांहीं साक्रेटिसाचे शिष्य होते. यामुळे तर लोकक्षोभांत जास्तच भर पडण्यास कारण झाले. अथेन्सला भोगाव्या लागलेल्या सर्व आपत्तींचे आदिकारण सॉक्रेटिस चें शिक्षण, अशी लोकांची समजूत झाली. तेव्हां हें मूळच नाहीसे करून टाकले पाहिजे असे कित्येकांस वाटून त्यांनीं साक्रेटिसावर फौजदारी खटला करून त्याचा अंत करण्याचा निश्चय केला व तो अथेन्समधल्या न्यायपद्धतीमुळे त्यांना सहज पार पाडता आला.
{{gap}}अथेन्समधील न्यायपद्धतीची हल्लीच्या काळच्या लोकांना मुळींच कल्पना यावयाची नाही. अथेन्सच्या राजकीय सत्तेप्रमाणेच अथेन्सची न्यायपद्धतीही पूर्ण लोकसत्तात्मक होती. तेथे आधी लिहिलेले असे कायदे नसत, निष्णात न्यायाधीशही नसत, सामान्य लोकांची ज्यूरी असे. परंतु ही ज्यूरी इंग्रजी पद्धतीप्रमाणे न्यायाधीशास सल्ला देण्यापुरतीच नसे, तर सर्व न्यायाचे अधिकार ज्यूररच्या मताधिक्यावर अवलंबून असत व ज्यूररची संख्याही फारच मोठी असे. म्हणून अथेन्समधील न्यायसभा ही लोकसभेप्रमाणे सर्व नागरिकांची सभाच असे. वादीप्रतिवादींनी आपापले खटले स्वतःच चालविले पाहिजेत असाही दुसरा एक नियम असे. न्यायसभेच्या अशा घटनेमुळे खटले वादीप्रतिवादींनी स्वतःच चालविण्याच्या नियमाने व कारभाराच्या पूर्ण लोकतत्वामुळे ग्रीस देशांत वक्तृत्व<noinclude>{{center|१३}}</noinclude> 7rwshrks6w7j8iys0k5zrsnr77recz0 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२० 104 110007 229915 229006 2026-05-08T15:55:03Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229915 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>शिखरास पोहोंचलें होतें. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसऱ्या कोठेंच झाली नाहीं. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तींची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्तृत्व आवश्यक होतें व वक्तृत्वकला हें तेथल्या शिक्षणाचे एक प्रमुख अंग झाले होतें. असो.
{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ३९९ या वर्षी सॉक्रेटिसावर खटला झाला. खटल्याची नोटिस मेलीटस या कवीने दिलेली होती व खटल्यांत एक धार्मिक आरोप असल्यामुळे अथीनीयन कायद्याप्रमाणें आर्कन नांवाच्या अधिकाऱ्याने पूर्वतपास केला होता व न्यायसभेचा या दिवशीं तोच अध्यक्ष होता. ज्यूरर ५०१ होते. खटल्याचा निकाल योग्य व खऱ्या रीतीनें देऊ अशी शपथ घेतल्यावर ज्यूरर लोक चटया आंथरलेल्या लांब बांकावर येऊन बसले. शेजारी असलेल्या प्लॅटफॉर्मवर वादीप्रतिवादी समोरासमोर ठाकले. कठडयाच्या पलीकडे पुष्कळ प्रेक्षक बसले होते. धूपारती व न्यायसभेच्या घोषकानें म्हटलेली प्रार्थना होऊन कामाला सुरुवात झाली. कोर्टाच्या क्लार्कने आरोप व लेखी कैफियत वाचली. 'आरोप असा होता :-
{{gap}}"सॉक्रेटिस हा गुन्हेगार आहे. कारण तो संस्थाननें मानलेले देव मानीत नाहीं व त्यानें नवीन देवांचा लोकांत प्रसार केला आहे; आणखी तो तरुणांना बिघडवितो."
{{gap}}नंतर अध्यक्षानें वादीपक्षाच्या लोकांस अग्रासनीं येऊन बोलण्यास फर्माविलें. प्रथमतः मेलीटस कवि बोलला. त्याचे भाषण म्हणजे आपल्या देशभक्तीचें व वक्तृत्वकलेचें प्रदर्शन होतें! परंतु त्याचें भाषण फारसें चांगले झालें नाहीं. नंतर अनीटस व लायकन यांची भाषणे झाली. तीं जास्त चांगली झाली व त्यांचा ज्यूररवर परिणामही झाला. अनीटस म्हणाला, "सॉक्रेटिसाशी आपला खाजगी द्वेष नाहीं व कोर्टाचे समन्स न मानतां जर सॉक्रेटीस देश सोडून जाता तर आपल्याला आनंद झाला असता. परंतु ज्या अर्थी सॉक्रेटिस हजर राहिला आहे त्या अर्थी आतां त्याची सुटका होणं श्रेयस्कर नाहीं."{{nop}}<noinclude>{{center|१४}}</noinclude> 9xfhegmg8af6nx3bykxwu798nezqxkl पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२१ 104 110008 229916 229003 2026-05-08T15:58:27Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229916 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''सॉक्रेटिस'''}}</noinclude>{{gap}}वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः—
{{gap}}"अथीनियन नागरिकहो! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल! परंतु त्यांच्या असत्य विधानांपैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हे:- त्यांनी तुम्हांला सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ घालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसभेत पाऊल टाकंण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेहमींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोलण्याची भाषाशैली कशी आहे- ती चांगली असेल अगर वाईट असेल-<noinclude>{{center|१५}}</noinclude> cky5lb50xukthe3pw9d2bozx9kw5hoe पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२२ 104 110009 229917 229388 2026-05-08T16:01:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229917 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्त्वज्ञानी.'''</noinclude>त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं हे आपण पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हे ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे."
{{gap}}माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेलीटस व त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांनी आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हणण्याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे.
{{gap}}जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, 'सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य आहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तुजाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभासरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे, परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं! अशा प्रकारचें ज्ञान मनुष्यास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास! माझी पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कधी बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची मनोमय साक्ष पटेल.
{{gap}}"तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे! असें जर मला करता<noinclude>{{center|१६}}</noinclude> 42ljiijzulsb7enibu8phs9fpo0grif पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२३ 104 110010 229918 229020 2026-05-08T16:04:23Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 229918 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>आले असते तर फार चांगले होते. कांही लोक आपल्याला मनुष्याच्या कर्तव्यकर्माचं ज्ञान करून देतां येते अशी घमेंड मारतात व अशा तऱ्हेने पुष्कळ पैसे मिळवितात व तरुण लोक यांचे पाठीमागे लागतात. परंतु मी अशा तऱ्हेची घमेंड मारली नाहीं किंवा कोणाकडून पैसेही मिळविले नाहींत!
{{gap}}"पण आपणांपैकी कोणी तरी विचारील, 'अहो सॅक्रेटिस! जर तुम्हीं कांहीं केलें नाहीं असे म्हणतां तर मग तुमच्याबद्दल इतकी निंदा कां? सामान्य लोकांमध्ये नाही असे काहीं तरी असाधारण तुमच्या वर्तनांत तुमच्या पद्धतींत असल्याखेरीज तुमच्याविरुद्ध इतक्या कंड्या पिकतील कशा? तेव्हां तुमचा खरा व्यवसाय काय तो आम्हांला सांगा. म्हणजे तुमच्या खटल्याचा आम्हांस योग्य निकाल करण्यास सांपडेल.' हा प्रश्न वाजवी आहे व माझ्याविरुद्ध इतक्या कंड्या कां पिकल्या व माझें नांव इतके वाईट का झाले आहे याचे स्पष्टीकरण मी आतां करणार आहे. मी विनोदाने कांही तरी सांगत आहे, असें समजूं नका. मी अगदी सत्य तेच सांगत आहे. माझें नांव बद्दू होण्याचे कारण माझ्यमध्ये असलेले एक प्रकारचे शहाणपण होय. हे शहाणपण सर्व मनुष्यप्राण्यांस साध्य करून घेता येण्यासारखे आहे. परंतु या निराळे एखादें शहाणपण माझे अंगीं नाहीं. माझ्या प्रतिपक्षीयांना असल्यास न कळे! या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी डेलफाय देवाची साक्ष आणू शकेन. तुम्हांला चेरीफान ठाऊक आहे. तो तरुणपणापासून माझा सोबती होता. त्यानें लोकांबरोबर जुलमी अमलात देशत्याग केला व लोकांबरोबरच तो परत आला. त्याचा स्वभावही तुम्हांला माहीत आहे. त्याने एखादी गोष्ट मनांत आणली म्हणजे ती तो शेवटास नेल्याखेरीज रहावयाचा नाहीं. त्याने एकदां डेलफाय देवाला प्रश्न विचारला कीं, 'सॉक्रेटिसापेक्षां कोणी शहाणा आहे काय?' देवाकडून उत्तर आले,'नाही.' ही गोष्ट खरी आहे याची साक्ष चेरीफानचा येथें हजर असलेला भाऊ देऊ शकेल."{{nop}}<noinclude>{{center|१७}} {{left|सा...२}}</noinclude> 20immuivmrwh1fxnixh0mexptrb604v पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६७ 104 110316 229919 2026-05-09T06:36:10Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "जग चिन्मय आहे, असे म्हटल्यावर जडवादाला जागाच राहात नाही, आणि मग जीवात्मा व परमात्मा एवढीच चिन्मय तत्त्वे शिल्लक राहतात, आणि या योगाने मनुष्याची खऱ्या धर्माकडे प्रवृत्ति होईल अस..." 229919 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>जग चिन्मय आहे, असे म्हटल्यावर जडवादाला जागाच राहात नाही, आणि मग जीवात्मा व परमात्मा एवढीच चिन्मय तत्त्वे शिल्लक राहतात, आणि या योगाने मनुष्याची खऱ्या धर्माकडे प्रवृत्ति होईल असें बार्लेला वाटत असे. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाचा हेतु मनुष्याला धर्मपरायण करण्याचा होता, व औपचारिक कर्मकांडात्मक धर्माचारापेक्षा याच तात्त्विक धर्माला बार्क्ले जास्त महत्त्व देत असे. या दोन ग्रंथांनी बार्क्लेची स्वतंत्र विचाराचा तत्त्वज्ञानी व उत्तम लेखक अशी ख्याति झाली.
{{gap}}काही अंशी प्रकृतीकरितां, आणि काही अंशी त्या काळच्या ग्रंथकारांचा परिचय करून घेण्याकरितां व साधल्यास आपल्या 'संभाषण' नामक पुस्तकाच्या प्रसिद्धीकरितां बार्क्लेने इंग्लंडमध्ये लंडनला जावयाचे ठरविले. त्याकरितां आपल्या ट्रिनिटी कॉलेजांतून त्याने रजा घेतली. तो इंग्लंडला आल्यावर त्याची लंडनमधल्या विद्वद्रत्नाशी ओळख करून देण्याची खटपट बार्क्लेचा देशबंध 'गलिव्हरच्या वृत्तांता'चा प्रसिद्ध कर्ता स्विफ्ट, व प्रसिद्ध ग्रंथकार स्टील यांनी केली. दोघांचेंहि बार्क्लेच्या प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांवरून चांगले मत झालेले होते. त्यांनी आपल्या देशांतील या होतकरू तत्त्वज्ञान्याची राजदरबारीहि ओळख करून दिली. स्टीलच्या 'गार्डियन' या पत्रांत बार्क्ले निबंध लिहूं लागला. प्रत्येक निबंधाबद्दल त्याला एक गिनी मिळत असे. आपल्या मित्राच्या साहाय्याने बार्क्लेने ट्रिनिटी कॉलेजांत असतांना लिहिलेला तत्त्वज्ञानात्मक संभाषणाचा ग्रंथ लंडनमध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथाने त्याची सर्वत्र वाहवा होऊन त्याच्या मताचा झपाट्याने प्रसार झाला. त्याच्या मताला पुष्कळ अनुयायी मिळाले, व त्याची यूरोपांतील प्रमुख तत्त्वज्ञान्यांत गणना होऊ लागली.
{{gap}}बार्क्लेच्या या कीर्तीमुळे त्याला सरकरादरबारांत मान मिळू लागला व युरोपांत प्रवास करण्याची त्याला संधि आली. लॉर्ड पिटरबरो या वजनदार सरदाराची सिसिलीच्या राजाकडे वकील म्हणून नेमणूक झाली व त्याने बार्क्लेला आपला चिटणीस म्हणून बरोबर नेण्याचे ठरविले.
{{gap}}बार्क्लेच्या आयुष्यांतील ही प्रवासाची वर्षे त्याला फार आनंदांत गेली<noinclude>{{center|६१}}</noinclude> rnl3pya433b737km2j8g6aw0xdgcoyh पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६८ 104 110317 229920 2026-05-09T06:37:03Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "व या त्याच्या प्रवासामुळे त्याला ग्रीक तत्वज्ञानाचा विशेष नाद लागून त्याच्या पुढील तात्विक मतांवर प्लेटो या ग्रंथकर्त्याच्या लेखांचा फारच परिणाम झाला. फ्रान्स, इटली व ग्रीस य..." 229920 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>व या त्याच्या प्रवासामुळे त्याला ग्रीक तत्वज्ञानाचा विशेष नाद लागून त्याच्या पुढील तात्विक मतांवर प्लेटो या ग्रंथकर्त्याच्या लेखांचा फारच परिणाम झाला. फ्रान्स, इटली व ग्रीस या देशांमधल्या मोठमोठ्या शहरांत बार्क्लेला महिनेच्या महिने राहण्याला सांपडले व त्याने आपल्या या निवासाचा पूर्ण फायदा करून घेतला. आपल्या प्रवासाची व त्या प्रवासांत पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर वर्णने बार्क्ले इंग्लंडांतील आपल्या स्नेह्यांना पाठवीत असे. हा सर्व पत्रव्यवहार प्रसिद्ध झालेला आहे व त्यावरून बार्क्लेची सूक्ष्म अवलोकनशक्ति, त्याचा मार्मिकपणा, त्याची सदभिरुचि, व पाहिलेल्या गोष्टींचे हुबेहूब वर्णन करण्याची त्याची शैली ही उत्तम तऱ्हेने दिसून येतात.
{{gap}}सुमारे वर्षदीड वर्ष युरोपांत काढल्यावर अन राणीच्या मृत्यूमुळे मंत्रिमंडळांत फरक झाला, व लॉर्ड पिटरबरोंना परत यावे लागले. त्यामुळे बार्क्लेलाही लंडनला परतावे लागले. त्यामुळे बार्क्लेची प्रवासाची हौस पूर्ण झाली नव्हती. स्विफ्टच्या वजनाने बार्क्लेला एका श्रीमंत मुलाच्या खाजगी शिक्षकाची जागा मिळून तो पुनः इंग्लंडांतून युरोपांत गेला. या वेळी त्याला चार वर्षे युरोपात घालवितां आली. अर्थात् आयलैंड सोडून त्याला एकंदर सात वर्षे झाली.
{{gap}}१७२० च्या सुमाराला बार्क्ले इंग्लंडांत परत आला. तों इंग्लंडमध्ये 'साउथ सी बबल' या नांवाने इंग्लंडच्या इतिहासांत प्रसिद्ध असलेल्या व्यापारी कंपनीचा बोजवारा होऊन लोकांची फार दैना झाली होती. बार्क्लेनें या बाबतींत एक निबंध प्रसिद्ध करून त्यांत त्याने लोकांच्या दोषांचे आविष्करण केले व हे दोष नाहीसे झाल्याखेरजि देशाचा तरणोपाय नाही असे प्रतिपादन केले. पण या प्रसंगाने निवळ तात्विक व वाङ्मयी विषयांपेक्षां सामाजिक सुधारणेकडे बार्क्लेचे जास्त लक्ष्य वेधले व कांहीं तरी लोककल्याणाचे प्रत्यक्ष काम आपण हाती घ्यावे, असा विचार त्याच्या मनांत घोळू लागला.
{{gap}}देशी परत आल्यावर बाळूला आयुष्यक्रम कायम करण्याची संधि<noinclude>{{center|६२}}</noinclude> qcubj9i6f5qd6ojynv19g3oy5koho1h पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६९ 104 110318 229921 2026-05-09T06:38:05Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मिळाली. कारण त्याच्या कॉलेजांत तो आधीपासून फेलो होताच, पण परत आल्यावर त्याला अधिक पगाराच्या शिक्षकाच्या जागेवर नेमण्यांत आले. तसेच त्याने इंग्लंडांत असतांना उपाध्यायाच्या धंद..." 229921 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>मिळाली. कारण त्याच्या कॉलेजांत तो आधीपासून फेलो होताच, पण परत आल्यावर त्याला अधिक पगाराच्या शिक्षकाच्या जागेवर नेमण्यांत आले. तसेच त्याने इंग्लंडांत असतांना उपाध्यायाच्या धंद्याची दीक्षा घेतली असल्यामुळे त्या कामावरही त्याला नेमण्यांत आले. पण लोककल्याणाची कल्पना त्याच्या डोक्यांत घोळत असल्यामुळे या स्वार्थी आयुष्यक्रमाने व उद्योगांनी त्याचे समाधान होईना. याच वेळी एका मृत्युपत्रान्वयें बरीच मोठी द्रव्याची देणगी त्याला मिळाली. यामुळे त्याच्या लोककल्याणाच्या इच्छेने उचल खाल्ली व आपण बरमुडा बेटांत जाऊन तेथे एक विद्यापीठ स्थापन करावे, असे त्याच्या मनाने घेतले. या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याकरतां आपल्याला मिळालेली सर्व संपत्ति, तसेंच आपल्याला दिलेल्या कॉलेजांतील व धर्मखात्यांतील मानाच्या व फायदेशीर जागाहि सोडण्याला तो तयार झाला. त्याने काही तरुण मंडळीला आपल्या बेताला अनुकूलं करून घेतले व आपल्या भावी विद्यापीठाला सरकारी सनद व सरकारी मदत मिळविण्याची खटपट करण्याकरतां बार्क्ले पुनः इंग्लंडांत आला.
{{gap}}पहिल्याप्रथम ज्याप्रमाणे स्विफ्टने बार्क्लेला राजदरबारी प्रवेश करवून दिला, त्याचप्रमाणे याहि वेळी त्याने बार्क्लेकरितां खटपट केली. बार्क्लेने आपला विद्यापीठाचा बेत सविस्तरपणे पुष्कळ जणांना सांगितला व त्याने खासगी गृहस्थांकडून पैशाच्या मदतीची आश्वासने घेतली. बार्क्लेच्या वक्तृत्वाने व कळकळीने या बेताला बरेंच स्वरूप आले. त्याने जार्ज राजाची मुलाखत घेतली व राजालाहि ही कल्पना पसंत पडली. मुख्य प्रधान वालपोल हा मोठा धोरणी, मुत्सद्दी व व्यवहारज्ञ होता. त्याला बार्क्लेची कल्पना अव्यवहार्य वाटली; पण राजाचा कल पाहून त्याने आपले विरुद्ध मत दिले नाही. त्याच्या मनाची अशी कल्पना होती, की, पार्लमेंटमध्ये ही योजना पसंत होणार नाही. पण येथे वालपोलची अटकळ फसली. कारण बार्क्लेने फारच खटपट केली. तो प्रत्येक सभासदाला जाऊन भेटला व आपल्या गोड भाषणाने त्याने<noinclude>{{center|६३}}</noinclude> 7qvo380z1dkw9h80vo3i7mdnhkoasca पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७० 104 110319 229922 2026-05-09T06:39:16Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "आपल्या योजनेला सर्वांची अनुमति मिळविली, व वालपोलच्या अटकळीबाहेर बार्क्लेच्या योजनेला यश येत चालले. सनद देण्यासंबंधी व विद्यापीठाच्या घटनेसंबंधी व पैशाच्या मदतीसंबंधी ठराव प..." 229922 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>आपल्या योजनेला सर्वांची अनुमति मिळविली, व वालपोलच्या अटकळीबाहेर बार्क्लेच्या योजनेला यश येत चालले. सनद देण्यासंबंधी व विद्यापीठाच्या घटनेसंबंधी व पैशाच्या मदतीसंबंधी ठराव पार्लमेंटांत पास झाले व चार वर्षांच्या खटपटीने आपली योजना मूर्त स्वरूप धारण करणार म्हणून बार्क्लेला मोठा आनंद झाला. आपल्या नव्या लोककल्याणाच्या कामगिरीवर जाण्यापूर्वी बार्क्लेने एका सुशील मुलीशी विवाह करून घेतला, व मोठया हुरुपाने १७२८ साली तो प्रथमतः रोडबेटांत जाण्याकरितां जहाजावर चढला.
{{gap}}आपल्या विद्यापीठाला सनद मिळण्याचे आणि वार्षिक वर्गणी मिळण्याचे सरकाराकडून आश्वासन मिळाले, आणि लोकांनीहि चागला आश्रय देण्याचे कबूल केले, तेव्हां आतां कोणतेंहि विघ्न राहिले नाहीं. असें बार्क्लेला वाटले. पण बार्क्लेसारख्या सरळ, उत्साही व परोपकाररत पुरुषाला व्यवहारज्ञ, कुटिलनीतिनिपुण आणि स्वार्थी मुत्सद्यांच्या धोरणी वर्तनाचे बीज कसे कळावे ? बार्क्ले रोड बेटांत जाऊन पोहोंचला. तेथली एकंदर सृष्टिशोभा आणि परिस्थिति पाहून आपल्या पहिल्या योजनेपेक्षा येथेच विद्यापीठ काढणे चांगले, असे त्याला दिसून आले. पण सरकारी वीस हजार पौंडांची मदत येण्याची तो वाट पहात होता. वोलपोलच्या मनांत बार्क्लेच्या योजनेबद्दल मुळीच आस्था नव्हती. राजाच्या मर्जीविरुद्ध जायाचे नाही, म्हणून तो विरुद्ध नव्हता, इतकेंच. पण तो कोठावळा होता ! प्रत्यक्ष पैसे देणे त्याच्या हातांत होते. जेव्हां बार्क्लेच्या मित्रांनी वालपोलला पार्लमेंटमध्ये पसार झालेल्या ठरावाप्रमाणे पैसे देण्याबद्दल तगादा लावला, तेव्हां त्याने दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो म्हणाला "प्रधान या नात्याने जर तुम्ही मला प्रश्न विचारीत असाल, तर मला असे म्हटलेच पाहिजे. आणि मी खातरीने म्हणेन, की, सरकारी खजिन्याला सवड झाल्याबरोबर पैसे दिले जातील ! पण वीस हजार पौंडांच्या देणगीच्या भरवशावर डीन बार्क्लेने अमेरिकेत राहावे किंवा नाही, असे जर मित्रत्वाच्या<noinclude>{{center|६४}}</noinclude> avbn5or8nm0i4jmxikuunfk13cld0my पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७१ 104 110320 229923 2026-05-09T06:40:08Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "नात्याने तुम्ही मला विचारीत असाल, तर बार्क्लेने ताबडतोब युरोपला परत यावे, व देणगीची आशा सोडावी, असें मी सांगेन."
{{gap}}याप्रमाणे मुख्य प्रधानाने एका उदार योजनेचा नाश केला, याबद्दल..." 229923 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>नात्याने तुम्ही मला विचारीत असाल, तर बार्क्लेने ताबडतोब युरोपला परत यावे, व देणगीची आशा सोडावी, असें मी सांगेन."
{{gap}}याप्रमाणे मुख्य प्रधानाने एका उदार योजनेचा नाश केला, याबद्दल बार्क्लेला अत्यंत वाईट वाटले, हे उघड आहे.
{{gap}}सरकारी मदतीच्या भरवशावर बार्क्लेनें रोड बेटांत सुमारे शंभर एकरांचे एक शेत विकत घेऊन तेथे त्याने लहानसे घर बांधले, व त्याला राजाच्या स्मरणार्थ 'व्हाईट हॉल' असें नांव ठेवले. त्याचा येथला व्यवसाय म्हणजे अध्ययन व लेखन हा होता. दहा बारा वर्षात त्याला असा शांत वेळ मिळाला नव्हता. तेथली सृष्टिशोभाहि बार्क्लेला फार आवडत असे. समुद्रकाठची एका खडकाची गुहावजा जागा ही बार्क्लेची आवडती बसावयाची जागा होती. या ठिकाणीच बार्क्लेचा कुटुंबविस्तार झाला. येथे त्याला एक मुलगा व,एक मुलगी झाली पण दुर्दैवाने मुलगी फार दिवस जगली नाही.
{{gap}}सरकारी मदत मिळण्याची आशा नाही, हे ठाम झाल्यावर बार्क्लेला आपल्या योजनेचा नाद सोडून देणे भाग पडले, व तो आपल्या बायकांमुलांसकट १७३१ मध्ये इंग्लंडला परत आला. तरी बार्क्लेची अमेरिकेच्या सुधारणेची हौस कमी झाली नाही. त्याने आपले शेत येल विद्यालयांत शिष्यवृत्तीकरितां ठेविले. तसेच जमविलेल्या वर्गणीतून एक हजार पुस्तकांचा संग्रह त्याने येल विद्यालयाला नजर केला.
{{gap}}इंग्लंडांत परत आल्यावर दोन महिन्यांनी बार्क्लेने तत्त्वज्ञान या विषयावरील आपला सर्वात मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. हाहि संभाषणात्मक आहे. हा ग्रंथ बार्क्लेच्या सर्व ग्रंथांत अत्यंत लोकप्रिय झाला. रोड बेटामध्ये जी अवर्णनीय सृष्टिशोभा त्याला पाहण्याला सांपडली व तात्त्विक अध्ययन अणि मनन करण्याला जी स्वस्थता मिळली, त्या दोहोंची छटा या ग्रंथांत दिसून येते. हा बार्क्लेचा ग्रंथ तात्त्विक विषयावर असूनहि तो फारच मनोरंजक झालेला आहे. त्याच्या ग्रंथावर काही ठिकाणी प्रतिकूल टीका झाली, व त्याला त्याने उत्तरात्मक दुसरे पुस्तक लिहिले.<noinclude>{{center|६५}}</noinclude> 6fqz1la56to2rqgo0s3d4r523x5m549 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७२ 104 110321 229924 2026-05-09T06:40:58Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "रोड बेटांतून परत आल्यावर एक वर्ष पर्यंत तो लंडनमध्ये राहिला, व या वर्षभर याचा सारखा लेखनव्यवसायच चालू होता.
{{gap}}१७३४ मध्ये बार्क्ले पुनः आपल्या देशी आयर्लंडला परत आला. अमेरिकेत..." 229924 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>रोड बेटांतून परत आल्यावर एक वर्ष पर्यंत तो लंडनमध्ये राहिला, व या वर्षभर याचा सारखा लेखनव्यवसायच चालू होता.
{{gap}}१७३४ मध्ये बार्क्ले पुनः आपल्या देशी आयर्लंडला परत आला. अमेरिकेतील योजनेच्या बाबतीत सरकारच्या धोरणामुळे त्याची निराशा झाली होती. त्याची अंशतः भरपाई करण्याकरतां व काही अंशी बार्क्लेची थोर योग्यता मनांत आणून सरकारने बार्क्लेला क्लायानीची मोठ्या मानाची व हुद्याची बिशपची जागा दिली व बार्क्ले क्लायानी येथे राहायला गेला. येथे तो एकंदर अठरा वर्षे राहिला. बार्क्ले जरी प्रोटेस्टंटपंथी होता, तरी त्याची मतें उदार होती, आणि त्याचा देशाभिमानही संकुचित नव्हता. यामुळे तो प्रॉटेस्टंट व कथालिक या दोन्ही पंथांच्या लोकांना समानतेने वागवी. डब्लिन युनिव्हर्सिटींत कथालिक लोकाना घ्यावे असे त्याचे मत होते.
{{gap}}येथे आपले काम करीत असतां बार्क्लेचें लक्ष्य सामान्य लोकाच्या स्थितीकडे लागले व आयरिश लोकांची किती दैन्यावस्था आहे ह त्याच्या ध्यानांत येऊन मोठ्या लोकांचे लक्ष्य या गोष्टीकडे वेधाव म्हणून त्यान प्रश्नांच्या रूपाने आपले विचार प्रदर्शित केले. या प्रश्नांचे तीन भाग बार्क्लेने प्रसिद्ध केले. या तिन्ही भागांत सामाजिक व अर्थशास्त्रविषयक किती तरी तत्वे न कळत ग्रथित झाली आहेत. ह्यूम किंवा अर्थशास्त्राचा जनक अडम स्मिथ याच्यापूर्वी सुमारे ४० वर्षे हा ग्रंथ लिहिला गेला. त्या मानाने त्याची महती विशेषच आहे. ज्या ज्या विषयाकडे बार्क्ले आपले लक्ष घाली, त्या त्या विषयांत तो काही तरी नव्या कल्पना काढीत असे. साध्या व सुंदर भाषेत आपले विचार प्रदर्शित करण्याची विलक्षण हातोटी त्याला साधलेली होती.
{{gap}}वर सांगितलेच आहे की, क्लॉयानीचा बिशप या नात्याने बार्क्लेने १८ वर्षे त्या ठिकाणी काढली. या इतक्या अवकाशांत तो एकदांच बाहेर गेला होता व तो डबलीन येथे पार्लमेंट चालू असतांना होय.
{{gap}}बार्क्ले क्लायानी येथे कायमचा येऊन राहिल्यावर १७३९ मध्ये आय<noinclude>{{center|६६}}</noinclude> 6otnq7cwn6bxi5dwoggyjye6twjj4fv पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७३ 104 110322 229925 2026-05-09T06:41:41Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "लैंडांत मोठा दुष्काळ पडला व दुष्काळाची सोबतीण सांथ हीहि सुरू झाली. यामुळे हजारों लोक मरण पावले. या दुर्धर प्रसंगाने बार्क्लेचे लक्ष्य रोगाला एकादें औषध शोधून काढण्याकडे लागले...." 229925 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>लैंडांत मोठा दुष्काळ पडला व दुष्काळाची सोबतीण सांथ हीहि सुरू झाली. यामुळे हजारों लोक मरण पावले. या दुर्धर प्रसंगाने बार्क्लेचे लक्ष्य रोगाला एकादें औषध शोधून काढण्याकडे लागले. रोड बेटांत असतांना तेथील रहिवाशांकडून त्याने डामर या पदार्थाच्या विलक्षण गुणाबद्दल ऐकलें होते. त्यासंबंधी त्याने आतां प्रयोग चालविले व डामराच्या पाण्यापासून पुष्कळ ठिकाणी फार गुण येतो, असे त्याला दिसून आले. बार्क्लेच्या नेहमींच्या उत्साही स्वभावाप्रमाणे हे औषध सर्वरोगपरिहारक आहे, अशी त्याची समजूत होऊन डामराच्या पाण्याच्या रामबाणपणाबद्दल त्याने लेख लिहिले व त्याचा जनसमूहावर विलक्षण परिणाम झाला. जिकडे तिकडे डामराचे पाणी तयार करण्याचे कारखाने निघाले! या वेळी शास्त्रीय वैद्याबरोबर बार्क्लेला दोन हात करावे लागले व ते त्याने केलेहि. डामराच्या या विलक्षण शक्ती संबंधी बार्क्लेच्या डोक्यात विचार घोळू लागले. या काळी त्याचे वाचन प्लेटो व नीओप्लॅटनिझम यांबदल चालू होते. यामुळे या दृश्य जगाच्या मुळाशी कांहीं एक अदृश्य तत्व आहे अशी त्याची समजूत झाली व कशा तरी तऱ्हेनें डामरांत तें अदृश्य तत्व येत असावे, व म्हणूनच डामराच्या अंगीं सर्वरोगपरिहारक अशी विलक्षण शक्ति उत्पन्न होत असावी असे बार्क्लेच्या मनाने घेतले. याप्रमाणे वैद्यशास्त्र व तत्वज्ञान यांचा मिलाफ त्याच्या मनांत अवतीर्ण होऊन याच मनःस्थितीत त्याने 'सांखळी' म्हणून एक ग्रंथ प्रसिद्ध केला. यांतील डामरासंबंधाचा भाग अर्थात्च क्षणिक महत्त्वाचा होता. डामरासंबंधी बार्क्लेचे विचार अर्वाचीन वैद्यशास्त्राला संमत नाहीत. तरी पण डामर आणि त्याचाच पर्याय क्रिआसोट ही दोन औषधे अर्वाचीन वैद्यकांत कायमची आली, हा बार्क्लेच्या लेखांचा आणि प्रयोगांचा परिणाम होय, यांत शंका नाही ! परंतु 'सांखळी' या ग्रंथांतील तात्विक भाग हा कायमच्या महत्वाचा आहे व या भागावरून बार्क्लेच्या तात्विक विचारांची वाढ सारखी होत होती असे दसते. बार्क्लेच्या कालेजांतील तरुणपणच्या दिवसांत त्याचा विशेष ओढा जड द्रव्याचा अभाव सिद्ध करण्याकडे होता. या काळांत त्याचा<noinclude>{{center|६७}}</noinclude> h914bqg724x0xyyu3gbyisis9erzvzh पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७४ 104 110323 229926 2026-05-09T06:42:33Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रत्यक्षावर जास्त जोर होता; व प्रत्यक्ष संवेदनाच्या पलीकडे ज्ञेय असे काही नाही, असे त्याने प्रतिपादन केले. त्याच्या मध्यआयुष्यात त्याचा भर नास्तिक लोकांविरुद्ध होता व त्याच्..." 229926 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रत्यक्षावर जास्त जोर होता; व प्रत्यक्ष संवेदनाच्या पलीकडे ज्ञेय असे काही नाही, असे त्याने प्रतिपादन केले. त्याच्या मध्यआयुष्यात त्याचा भर नास्तिक लोकांविरुद्ध होता व त्याच्या उतारवयांत त्याची मते प्लेटोच्या सारखी होत चालली होती. दृश्य संवेदनाच्या किंवा इंद्रियांनी गोचर होणाऱ्या दृश्य जगाच्या पाठीमागे चिन्मय असें एक तत्व आहे व या चिन्मय तत्वाचा आपले दृश्य जग हा विकास आहे, असें बार्क्लेला भासू लागले होते, आणि हाच तत्वविचार 'सांखळी' या ग्रंथांत प्रमुखत्वाने आलेला आहे.
{{gap}}बार्क्लेचा संसार मोठ्या सुखाचा झाला. त्याला बायको त्याच्या अनुरूप मिळाली होती. त्याला दोन मुलगे, एक मुलगी ( रोड बेटांत अगदी लहानपणी वारलेली मुलगी सोडून) इतकीच अपत्ये झाली. मात्र त्याच्या उतारवयांत त्याचा एक तरुण मुलगा वारला. प्रसिद्ध मुत्सद्दी बर्कला जसें पुत्रवियोगाचे दुःख झालें, तशीच बार्क्लेची स्थिति झाली. एका पत्रांत बार्क्लेने आपल्या या पुत्रनिधनाचा उल्लेख केलेला आहे. ते पत्र मनाला चटका लावण्यासारखे आहे:-
{{gap}}"खाजगी व दरबारी व्यवसाय, व ज्याला लोकांत सुख मानतात, या सर्वांपासून मी अलिप्त होतो. माझ्या नजरेखाली शिकलेला माझा एक लहानसा मित्र होता. त्याचे चित्रलेखन मला आनंद देत असे, त्याचे गायन मला मोहून टाकी, आणि त्याचा तरतरीत व आनंदी स्वभाव माझी नेहमी करमणूक करी. देवाने माझा मित्र हिरावून नेला ! देवाची मर्जी ! त्याचे गुण व त्याचे स्वरूप, त्याचा साधेपणा, त्याची धर्मनिष्ठा व विशेषतः त्याची पितृभक्ति यांनी माझ्यावर फार छाप ठेवली होती. मला तो प्रिय होता, इतकेच नव्हे, त्याचा मला गर्व वाटे! या जगांतील वस्तूंवर ठेवू नये इतका मी त्याच्यावर आपला जीव ठेवला होता.”
{{gap}}आतां बार्क्लेच्या आयुष्यातील एकच प्रसंगाची हकीकत सांगावयाचा राहिली. बार्क्लेने आपल्या मुलाला ऑक्सफर्ड विद्यालयांत घातले व आपणही आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस त्याच विद्यापीठाच्या ठिकाणी घाल-<noinclude>{{center|६८}}</noinclude> q38gvfpm11miwufodcv7xb5hgpg2znk पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७५ 104 110324 229927 2026-05-09T06:45:18Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "वावे, असे त्याच्या मनाने घेतले व आपल्या निश्चयी व उत्साही स्वभावानुरूप कसल्याही अडचणींना न जुमानतां बार्क्लेने आपला निश्चय पार पाडला. आपला बिशपचा हुद्दा कायम ठेवून त्याला नियम..." 229927 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>वावे, असे त्याच्या मनाने घेतले व आपल्या निश्चयी व उत्साही स्वभावानुरूप कसल्याही अडचणींना न जुमानतां बार्क्लेने आपला निश्चय पार पाडला. आपला बिशपचा हुद्दा कायम ठेवून त्याला नियमाप्रमाणे ऑक्सफर्डला जातां येईना, तेव्हां त्याने ताबडतोब त्या हुद्याचा राजिनामा दिला. पण जार्ज राजाने त्याच्या वयाकडे व विद्वत्तेकडे पाहून त्याच्याकरतां नेहमींच्या नियमाला अपवाद करून बार्क्लेला बिशपच्या हुद्याचा राजिनामा न देतां ऑक्सफर्डमध्ये राहण्याची परवानगी दिली. पण ऑक्सफर्डला येऊन बार्क्लेला फार दिवस झाले नाहीत, तोंच तो एके दिवशी आपल्या कुटुंबामध्ये मुलाबाळांसमवेत बोलत बसला असतां एकाएकी १७५३ मध्ये मरण पावला! अशा तऱ्हेचे सुखाचे मरण येणे फार थोड्यांच्या नशिबी असते.
{{gap}}बार्क्लेच्या चरित्रापासून त्याचा निश्चयी, उत्साही, सरळ स्वभाव उत्कृष्ट तऱ्हेने दिसून येतो. त्याचे तात्विक विचार आपल्या इकडल्या हरिदासाप्रमाणे प्रपंचापासून अलग राहिलेले नव्हते, तर त्या विचारांचा पूर्ण अंमल त्याच्या वर्तनावर झालेला होता. खऱ्या तत्त्वज्ञान्याप्रमाणे त्याची वृत्ति बनलेली होती. तो मान, पैसा किंवा कीर्ति यांकरितां हपापलेला नव्हता. आपल्या विचारांशी आचाराचे तादात्म्य करणारी माणसें विरळा म्हणून तुकाराममहाराजांनी अशी माणसें वंदनीय आहेत असे यथार्थ उद्गार काढलेले आहेत. त्याच कोटीपैकी बार्क्ले हा तत्वज्ञानी होता.<noinclude>{{center|६९}}</noinclude> a0211ax1dn81mse01o8w9twtcbwxdkg पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७६ 104 110325 229928 2026-05-09T06:46:15Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{center|(२)}} {{center|{{xx-larger|'''बार्क्लेचे तत्त्वज्ञान.'''}}}} {{gap}}येथपर्यंत बार्क्लेचे संक्षिप्त चरित्र व कालानुक्रमाने त्याच्या ग्रंथांची माहिती दिली. बार्क्लेच्या चरित्राकडे पाहिले म्हणजे अस..." 229928 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{center|(२)}} {{center|{{xx-larger|'''बार्क्लेचे तत्त्वज्ञान.'''}}}} {{gap}}येथपर्यंत बार्क्लेचे संक्षिप्त चरित्र व कालानुक्रमाने त्याच्या ग्रंथांची माहिती दिली. बार्क्लेच्या चरित्राकडे पाहिले म्हणजे असे दिसून येते की, ज्याप्रमाणे केव्हां केव्हां कवि हे स्वयंस्फूर्तीने-अभ्यासाने-अनुकरणाने-परिश्रमाने नव्हें-कवि बनतात त्याप्रमाणे बार्क्ले हा स्वयंस्फूर्तीने तत्वज्ञानी बनलेला होता. कॉलेजापासून त्याचे तत्त्वज्ञानविषयक विचार चालू झाले व ते आमरणांत चालू राहिले. यामुळेच त्याचे तत्त्वज्ञानविषयक विचार ठाम किंवा स्थिर न राहता ते कांहींसे बदलत गेले व त्या विचारांचे सिंहावलोकन करणारास त्या विचारांची प्रगति होत गेलेली आहे असें दिसते. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानविषयक विचारामध्ये जणू काही अर्वाचीन युरोपच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे स्वरूप अल्प प्रमाणांत दिसून येते. म्हणूनच बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाच्या तीन पायऱ्या पडतात असें बार्क्लेच्या चरित्रकारांनी म्हटले आहे. बार्क्लेच्या आयुष्यातील तत्त्वज्ञानविषयक विचारांत एकप्रकारची एकसूत्रता असून त्याच्या विचारांची सारखी परिणती होत गेलेली आहे असे दृष्टीस पडते. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाचें सामान्य धोरण त्या काळी बोकाळत चाललेल्या जडवादाविरुद्ध व नास्तिक्याविरुद्ध होते. जगाचे आदि कारण जड पंचमहाभूते नसून चिन्मय असा परमेश्वर आहे हे त्याने युक्तीच्या साहाय्याने प्रतिपादन केले व हे करण्याकरितां 'मूले कुठारः' या न्यायाने त्याने असे दाखविण्याचा प्रयत्न केला की ज्याला जड द्रव्य किंवा पंचमहाभूते म्हणतात तीच मुळी चित्तत्वाची संवेदनात्मक स्वरूपे होत. आतां बार्क्लेच्या तत्वज्ञानविषयक विचारांचे क्रमाने विवेचन करूं.{{nop}}<noinclude>{{center|७०}}</noinclude> 8nttx7n9r1t9ijeu3jikp6xu411wsyi पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७७ 104 110326 229929 2026-05-09T06:47:01Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{gap}}बार्क्लेचा पहिला तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ म्हणजे 'दृष्टीची नवी मीमांसा' हा होय. या ग्रंथाचा विषय बाह्यतः तत्त्वज्ञानाचा दिसत नाही; पण या विषयाचे पर्यवसान तात्त्विक आहे असे बार..." 229929 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{gap}}बार्क्लेचा पहिला तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ म्हणजे 'दृष्टीची नवी मीमांसा' हा होय. या ग्रंथाचा विषय बाह्यतः तत्त्वज्ञानाचा दिसत नाही; पण या विषयाचे पर्यवसान तात्त्विक आहे असे बार्क्लेने दाखविले आहे. आपल्या पांच ज्ञानेंद्रियांमध्ये आपण दृष्टीला किंवा डोळ्यांना जास्त महत्व देतो. कोणत्याही बाह्य गोष्टीच्या किंवा जड द्रव्याच्या अस्तित्वाचे अत्यंत भरंवशाचे प्रमाण म्हणजे अवलोकनाचे होय असे आपण म्हणतो, 'चक्षुवैसत्यं' या म्हणीवरून सत्यशोधनांत डोळ्याचें केवढे महत्त्व आहे हे समजते. 'प्रत्यक्ष' हा शब्दही तेच दाखवितो जडवाद्यांचे प्रमाणसर्वस्व म्हणजे प्रत्यक्ष होय. जेवढे डोळ्याने दिसते तेवढेच सत्य असें चार्वाकासारखे तत्त्वज्ञानी मानतात. असें या प्रत्यक्ष प्रमाणाचे महत्त्व असल्यामुळे बार्क्लेने या प्रमाणाचे पृथक्करण आपल्या ग्रंथांत केले आहे.
{{gap}}वस्तूंवा आकार, त्यांचे रंगरूप, त्यांची लांबी रुंदी खोली-सारांश वस्तूंचे मुख्य मुख्य गूण-विशेषतः त्या वस्तूंना जडत्व देणारे गुण-तसेंच वस्तूंमधले अंतर म्हणजे वस्तूंचे दूरपण किंवा नजीकपण हे सर्व गूण आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो असें सामान्यतः समजले जाते. पण बार्क्लेने असें प्रतिपादन केले की, हा आपला समज चुकीचा आहे. आपण खरोखरी हे सर्व विविध गुण प्रत्यक्ष पहात नाही, तर प्रत्यक्ष पाहिलेल्या गुणांवरून आपण इतर गुणांबद्दल अनुमान-अंदाज करतो.
{{gap}}दृष्टीचा खरा विषय रंग आहे. पदार्थापासून निघणारे किरण आपल्या डोळ्यांच्या बुबुळावर पडतात व आपल्या डोळ्यासमोर कमी अधिक स्पष्ट अशी रंगाची आकृति उभी राहते. आपल्या बुबुळांवर पदार्थाच्या किरणांची टाके पडतात. तो किरण दुरून आला किंवा जवळून आला हे किरणाच्या कमी अधिक लांबीवरून कळणे शक्य नाही. कारण किरणांची लांबी आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्या डोळ्यांना अंतर-पदार्थाचा नजिकपणा किंवा रपणा हा प्रत्यक्ष दिसत नाही. दूरच्या पदार्थाकडून आलेल्या किरणांनी पाडलेली आकृति लहान व अंधुक असते, तर जवळच्या पदार्था<noinclude>{{center|७१}}</noinclude> q4x9kyyeucyt21xdw25ha642t8lzc5d पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७८ 104 110327 229930 2026-05-09T06:48:37Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कडून आलेल्या किरणांनी पाडलेली आकृति अधिक मोठी व अधिक स्पष्ट असते इतकेंच, पदार्थाचा दूरपणा किंवा नजीकपणा हा आपल्याला खरोखरी गतीने प्रत्यक्ष कळतो. ज्या वस्तूकडे जाण्याला आपल्या..." 229930 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>कडून आलेल्या किरणांनी पाडलेली आकृति अधिक मोठी व अधिक स्पष्ट असते इतकेंच, पदार्थाचा दूरपणा किंवा नजीकपणा हा आपल्याला खरोखरी गतीने प्रत्यक्ष कळतो. ज्या वस्तूकडे जाण्याला आपल्याला जास्त चालावे लागते ती वस्तु दूर आहे असे आपण समजतो व ज्या वस्तूकडे जाण्याला थोडे चालावे लागते ती जवळ आहे असे आपण म्हणतों. वस्तु दूर असतांना तिची आपल्या डोळ्यावर पडणारी आकृति लहान व अंधुक अशी आपण पाहतों व जसजसे आपण वस्तूच्या जवळ जवळ जातो तसतशी ही आकृति मोठी व स्पष्ट होत आहे अस आपल्याला दिसून येते. तेव्हां आकृतीचा कमीअधिक अंधुकपणा व लहानमोठेपणा या पदार्थाच्या कमीअधिक दुरपणाच्या अंतराच्या खुणा आपल्या अनुभवावरून आपण मनांत बनवितों व वस्तूची डोळ्यावर पडलला आकृति स्पष्ट व मोठी असल्यास वस्तु जवळ आहे असे न कळत आपण अनुमान करतो. खरोखरी डोळ्यांनी आपल्याला पदार्थाचे अंतर किंवा खाली दिसत नाही. हळुहळ अनुभवाने आपण बिनचूक अनुमान करू शकतो. ही गोष्ट एका दाखल्याने स्पष्ट करता येईल. एखादा मनुष्य जन्मतः आंधळा आहे असे समजा, त्याला वस्तूंचे ज्ञान स्पर्शन्द्रियान व हालण्याचालण्याने किंवा गतीनेच फक्त झालेले असते. म्हणजे त्याला वस्तूची लांबीरुंदीखोली वस्तूचा दुरपणा वगैरे सर्व गोष्टी स्पर्शाने व गतीने प्रत्यक्ष झालेल्या असतात, पण त्याला वस्तूच्या रंगाचे ज्ञान नसते. अशा आंधळ्या मनुष्याला डोळे आले व त्याने एका आकाराचा व एका गाचा चेंडू व त्याच आकाराचे व त्याच रंगाचे चेंडूचे चित्र एकदम व सारख्या अंतरावरून पाहिले तर त्याला चेंडू कोणचा व चित्र कोणते हे ओळखत येणार नाही. कारण डोळ्यावर पडणाऱ्या दोन्ही रंगांच्या आकृतामध्ये सूक्ष्म भेद असेल खरा; पण तो भेद त्या डोळस झालेल्या आंधळ्याला कळणार नाही. त्या दिसत्या अकृतीकडे चालत जाऊन त्या दोन्ही वस्तूंना - स्पर्श करून जेव्हां तो डोळस मनुष्य पाहील तेव्हांच त्याला चित्र व चेंडू यातला फरक कळेल व मग पुनः दुरून डोळ्याने पाहून त्याला चित्राच्या व<noinclude>{{center|७२}}</noinclude> jjiwxevaza8yx54ut2m3snvq3u8spor पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७९ 104 110328 229931 2026-05-09T06:49:18Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "चेंडूच्या डोळ्यांवर पडलेल्या आकृतीतील सूक्ष्म भेद ध्यानांत येईल. म्हणजे डोळ्यांवर पडलेल्या आकृतीच्या कमीअधिक स्पष्टपणावरून तो स्पर्शेद्रियाने होणाऱ्या वस्तूच्या खऱ्या आका..." 229931 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>चेंडूच्या डोळ्यांवर पडलेल्या आकृतीतील सूक्ष्म भेद ध्यानांत येईल. म्हणजे डोळ्यांवर पडलेल्या आकृतीच्या कमीअधिक स्पष्टपणावरून तो स्पर्शेद्रियाने होणाऱ्या वस्तूच्या खऱ्या आकाराचे व स्वरूपाचे बिनचूक अनुमान करूं लागेल. आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष अंतर दिसत नाही, तर संवयीने व अनुभवाने आपण अंतर अजमावतों, याचे अर्वाचीन काळचे उदाहरण म्हणजे एकामागे एक असलेले सिग्नलचे दिवे होत. रात्रीच्या वेळी हे दिवे एकाच अंतरावर असून समोरासमोर असलेल्या दोन दिव्यांप्रमाणे नवख्या माणसाला भासतात. पण रात्रीच्या प्रहरी काम करणाऱ्या स्टेशनवरच्या पोटरला दिव्यांच्या उजेडाच्या कमीअधिक प्रमाणावरून व लहानमोठ्या आकारावरून दूरच्या अंतराचा दिवा कोणता व जवळचा कोणता हे बिनचूक सांगतां येते.
{{gap}}अशा व अशाच तऱ्हेच्या दुसऱ्या प्रमाणांवरून बार्क्लेने असे प्रतिपादन केले की, आपण जें वस्तूचे पाहणे म्हणतो ते खरोखरी पाहणे नसून अजमावणे असते. म्हणजे प्रत्येक अवलोकनक्रियेमध्ये मानवी मनाचा तर्कव्यापार न कळत चालू असतो. पदार्थापासून ज्या अवलोकन-संवेदना आपल्या मनावर उमटतात त्या एक प्रकारच्या खुणा असतात. त्यावरून त्याला दुसऱ्या इंद्रियांनी कोणत्या संवेदना अनुभवतां येतील हे समजते. आतां उघड उघड संवेदना या मानवी मनावर अवलंबून आहेत. मानवी मन नसेल तर संवेदना नाहीत व संवेदना नाहीत म्हणजे पदार्थ नाहीत. उदाहरणार्थ आंधळ्याला रंगाच्या संवेदना नाहीत. म्हणून त्याला डोळ्याने कोणत्याच गोष्टीचे आस्तित्व कळत नाही व त्या आंधळ्याला जर दुसरी स्पशेंद्रियांसारखी इंद्रिये नसली तर त्याला बाह्य वस्तूचे ज्ञान कांहीं होणार नाही, नव्हे बाह्य वस्तु ही कल्पनाच त्याला होणार नाही. त्याला भासणाऱ्या सर्व गोष्टी मानसिक आहेत असे त्याला वाटल. यावरून संवेदना या एक प्रकारची भाषा आहे असे म्हणणे प्राप्त आहे. ज्याप्रमाणे भाषेतील शब्दाचे द्वारे शब्दापेक्षां अगदी भिन्न अशा वस्तूचे आपल्याला<noinclude>{{center|७३}}</noinclude> cfr0225vtzqlyze6n3avgrzahe80rjp पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८० 104 110329 229932 2026-05-09T06:49:58Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ज्ञान होते, त्याप्रमाणे एका प्रकारच्या संवेदनांवरून भिन्न संवेदनांचे आपल्याला ज्ञान होते. हाच बार्क्लेच्या पहिल्या ग्रंथाचा मथितार्थ आहे.
या ग्रंथानंतर लवकरच प्रसिद्ध झाल..." 229932 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>ज्ञान होते, त्याप्रमाणे एका प्रकारच्या संवेदनांवरून भिन्न संवेदनांचे आपल्याला ज्ञान होते. हाच बार्क्लेच्या पहिल्या ग्रंथाचा मथितार्थ आहे.
या ग्रंथानंतर लवकरच प्रसिद्ध झालेला बार्क्लेचा दुसरा ग्रंथ म्हणजे 'मानवी ज्ञानावरील ग्रंथ' होय. या ग्रंथांत बार्क्लेने 'जड द्रव्य' 'बाह्य वस्तु' व 'अचेतन सृष्टि' या कल्पनांवरच घाला घातला आहे. ज्याला आपण बाह्य वस्तु म्हणतो, ज्या मानवी मनापासून अगदी भिन्न आहेत असे आपण समजतो त्या वस्तूचे ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या संवेदनांनी होते. एखादें नारिंग आपण पाहतो, त्याच्या रंगाचे ज्ञान आपल्याला डोळ्याने होते, त्याच्या आकाराचे, त्याच्या मदुपणाचें ज्ञान स्पर्शाने होते, त्याचा सुवास नाकाने कळतो, त्याची रुचि जिभेने कळते. सारांश नारिंगाचे सर्व गुण आपल्याला निरनिराळ्या इंद्रियांनी कळतात. आतां आपली इंद्रिये आपल्या मनांत संवेदना उत्पन्न करतात, म्हणजे आपले बाह्य वस्तूचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे, ज्यांना आपण बाह्य वस्तूंचे गुण म्हणतो त्या सर्व संवेदनाच होत. तेव्हां आतां बाह्य वस्तूंचे बाह्यत्व व स्वतंत्र अस्तित्व कोठे राहिले ? कारण समजा, आपण पहात असलेलें नारिंग गुप्तपणे नाहें सें झालें, पण जोपर्यंत आपल्या मनाला रंगाच्या, आकाराच्या, मृदुपणाच्या, सुवासाच्या, रुचीच्या व इतर गुणांच्या संवेदना भासत आहेत, तोपर्यंत ते नारिंग नाहीसे झाले आहे असे आपल्याला कळणारच नाही. अर्थात् पहिल्यापासूनच नारिंग नसले तरी त्याचीहि प्रतीतेि आपल्याला होणार नाही. जोपर्यंत आपल्याला संवेदना होत आहेत तोपर्यंत बाह्य वस्तु आहेच असें आपले मन आपल्याला सांगणार. तेव्हां बाह्य वस्तु म्हणजे संवेदनांचा समुदाय होय. वस्तूचे गुण म्हणजेही संवेदनाच होत. संवेदनाच्या किंवा गुणांच्या पाठीमागे असणारी निराळी आणखी बाह्य वस्तु नाही. तेव्हां बाह्य वस्तूची बार्क्लेच्या मताने खालील व्याख्या ठरते. नियमाने एकत्र राहणा संवेदनांचा समुदाय म्हणजे बाह्य वस्तु होत. बाह्य वस्तूंना मानवी मनाव्यतिरिक्त निराळे अस्तित्व नाही. या दृष्टीने जगांत जड म्हणून पदार्थच नाही असे होते;<noinclude>{{center|७४}}</noinclude> 4x5bivsxoy29kzmxxfakkb5anj4ddg5 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८१ 104 110330 229933 2026-05-09T06:50:37Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सर्व कांहीं चिन्मय आहे, कारण जड वस्तु ही मानवी मनाच्या संवेदना होत.
{{gap}}पण या सिद्धांतावर एक जबरदस्त आक्षेप येतो तो हा की, बाह्य वस्तु व सृष्टि ही संवेदनांसारखी क्षणिक ठरते. संवेद..." 229933 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>सर्व कांहीं चिन्मय आहे, कारण जड वस्तु ही मानवी मनाच्या संवेदना होत.
{{gap}}पण या सिद्धांतावर एक जबरदस्त आक्षेप येतो तो हा की, बाह्य वस्तु व सृष्टि ही संवेदनांसारखी क्षणिक ठरते. संवेदना अनुभवण्यास मनुष्य नसला की जग नाही असे यावरून सिद्ध होते. आपण निजलों की जग नाहीसे झाले या दृष्टीने 'आप गई डुब गई दुनिया' ही म्हण खरी ठरते. व ज्या वेळी जगावर मानवी प्राणी नव्हते तेव्हां जग नव्हते, असेहि या दृष्टीने निष्पन्न होते. या आक्षेपाच्या निराकरणांत बार्क्ले, परमेश्वरविषयक तत्व पुढे येते. मनुष्य पहात नसला, मानवी मन विनाश पावले तरी बाह्य सृष्टि विनाश पावत नाही. कारण अविनाशी व शाश्वत असा परमेश्वर आहेच. तेव्हां मनुष्य जरी निजला असला तरी जग नाहीसे होत नाही. कारण परमेश्वर सदा पाहत आहे. कारण बाह्य वस्तु जर संवेदनासमुदाय होत तर कोणत्या तरी मनाच्या, परमेश्वरी किंवा मानवी, संवेदना सतत चालूच आहेत. तेव्हां बार्क्लेच्या मतें बाह्य सृष्टि म्हणून कांही एक स्वतंत्र तत्त्व नाही. ते सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून आहे. परमेश्वर शाश्वत व अविनाशी आहे म्हणून सृष्टि ही शाश्वत व अविनाशी आहे. कारण सृष्टि ही परमेश्वराची संवेदनाच आहे, तेव्हां जगात दोन चिन्मय तत्वे आहेत एक परमेश्वर किंवा परमात्मा व दुसरें मनुष्य किंवा जीवात्मे. मनुष्याचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे, या संवेदना अन्वर्थक किंवा सूचक आहेत. म्हणजे एका प्रकारच्या सवेदनांवरून दुसऱ्या प्रकारच्या संवेदनांचे अनुमान करता येते. ज्याप्रमाणे वस्तूच्या रंगाच्या आकृतीवरून वस्तूचे अंतर आपल्याला कळते, त्याचप्रमाणे एका प्रकारच्या संवेदनांवरून दुसऱ्या प्रकारच्या संवेदनांचा आपल्याला अंदाज करता येतो. सृष्ठीचे ज्ञान म्हणजे या संवेदनांच्या सूचकत्वाचे ज्ञान होय. हे ज्ञान मनुष्याला अनुभवाने व संवईने येते. अमक्या संवेदनांचा अमुकच अर्थ कां याला काहीएक कारण देतां येत नाही. तसा आपला अनुभव आहे इतकेच आपल्याला म्हणतां येते.<noinclude>{{center|७५}}</noinclude> atkuv6mc3wxoaa7ev3um984cndm3z9i पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८२ 104 110331 229934 2026-05-09T06:51:17Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{gap}}येथे बार्क्ले पूर्ववयांतील तत्वज्ञान संपले. या तत्वज्ञानाचा हेतु मागे सांगितल्याप्रमाणे आस्तिक्य व धर्मनिष्ठा उत्पन्न करण्याचा होता व बार्क्लेच्या मते तो त्याने बऱ्याच अ..." 229934 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{gap}}येथे बार्क्ले पूर्ववयांतील तत्वज्ञान संपले. या तत्वज्ञानाचा हेतु मागे सांगितल्याप्रमाणे आस्तिक्य व धर्मनिष्ठा उत्पन्न करण्याचा होता व बार्क्लेच्या मते तो त्याने बऱ्याच अंशाने साध्य करून घेतला. कारण त्याच्या मते धर्माचा अत्यंत मोठा शत्रु म्हणजे जडवाद होय. सर्व जग-मानवी मनसुद्धां-मूळ जड द्रव्यापासून झाले आहे असें आधिभौतिक शास्त्र म्हणतात. अर्थात् या जगाच्या उपपत्तीमध्ये परमेश्वराला जागाच राहत नाही. असे झाले म्हणजे धर्मनिष्ठा ही अजिबात नाहींशी होते. कारण धर्माचा मूळ आधार जो परमेश्वर तोच जडामध्ये विलीन होतो. बार्क्लेने आपल्या तत्वज्ञानविषयक विचारांनी या आधिभौतिक शास्त्रीय विचारसरणींतील मूळ काटा काढून टाकला. त्याचे म्हणणे असें , मनुष्याच्या अवलोकनशक्तीचे पृथक्करण केले किंवा त्याच्या ज्ञानाचे पृथक्करण केले तर असे दिसून येते की, ज्याला 'जड द्रव्य' "जड आदि तत्व' म्हणतात ती कल्पना मुळांतच विसंगत आहे. सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे. त्या संवेदना चित्स्वरूप आहेत व त्यावरून परमात्मा व जीवात्मा अशी दोन तत्वे शाबीत होतात व जड तत्वाला वावच रहात नाही; नव्हे 'जड तत्व' ही कल्पना अज्ञानमूलक भासते. कारण तिच्या अस्तित्वाला कांहींच प्रमाण दाखवितां येत नाही, तेव्हां अशा अज्ञानमूलक पायावर उभारलेली जडवादाची व नास्तिक्य वादाची सर्व इमारत ढासळून पडते. व मग अर्थात् मनुष्य धर्मपरायण बनण्यास उशीर लागत नाही.
{{gap}}याप्रमाणे मानवी ज्ञानाच्या पृथक्करणाने जड तत्वाची कल्पना निराधार भासते; तर त्याच पृथक्करणाच्या योगे आपल्या आत्म्याची आपल्याला प्रचीति येते. जर सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे तर अर्थात् या संवेदना अनुभवणारा आत्मा अवश्यमेव असला पाहिजे असा आपत्याला प्रत्यय येतो. तसेंच संवेदना या शाश्वत आहेत, कायमच्या आहेत; त्याचप्रमाणे त्या एकमेकांच्या सूचक आहे; यावरून हे सर्व घडवून आणणारा परमात्मा याच्या अस्तित्वाबद्दल मनाची खातरी पटते.{{nop}}<noinclude>{{center|७६}}</noinclude> hksnqdljpk0z5nja77l2qufggqjx01h पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८३ 104 110332 229935 2026-05-09T06:52:39Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "हेच बार्लेच्या पूर्ववयांतील तत्वज्ञानाचे सार आहे. यांत बाक्लेंचा भर ज्ञान संवेदनात्मक आहे, व जडवाद हा विसंगत व बुद्धीला अग्राह्य आहे असे सिद्ध करण्याकडे आहे.
{{gap}}हीच मते बार्क्..." 229935 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>हेच बार्लेच्या पूर्ववयांतील तत्वज्ञानाचे सार आहे. यांत बाक्लेंचा भर ज्ञान संवेदनात्मक आहे, व जडवाद हा विसंगत व बुद्धीला अग्राह्य आहे असे सिद्ध करण्याकडे आहे.
{{gap}}हीच मते बार्क्लेन नंतरच्या आपल्या ग्रंथांत संभाषणरूपाने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे बार्क्लेचे लक्ष अमेरिकेत विश्वविद्यालय स्थापण्याच्या योजनेकडे लागले व याच काळांत त्याच्या वाचनांत प्लेटोच्या ग्रंथाने प्रमुख स्थान पटकावले व प्लेटोच्या विचारांचा बार्क्लेवर पगडा बसला. याचा परिणाम असा झाला की, त्याच्या मध्यकालीन तात्त्विक विचारांत थोडासा फरक पडला. आतां बार्क्लेला ज्ञानाचे संवेदनात्मक पृथक्करण अपुरे भासू लागले. संवेदनाखेरीज ज्ञानाचे विचाररूपी एक अंग आहे असें बार्क्लेच्या ध्यानात येऊ लागले. तेव्हापासन जडवादा विरुद्ध प्रतिपादनावरील त्याच्या लेखांचा भर कमी झाला व या जगाच्या मूळाशी परमात्मा व त्याचे विचार आहेत अशा प्रकारचे विवेचन जास्त जोराने पुढे आले. तसेंच संवेदनाचे सूचकत्व अनुभवाने-संईने कळतें असें पूर्वी बार्क्ले प्रतिपादन करीत असे त्याचेऐवजी सूचकत्व हे परमात्म्याच्या इच्छेचे व विचारशक्तीचें फळ आहे असे तो म्हणू लागला. सारांश, त्याच्या मध्यकालीन तत्त्वज्ञानमननांत परमात्म्याचे अस्तित्व व त्याचे स्वरूप व त्याच्या शक्ति या गोष्टींचा विचार त्याच्या मनाप प्रामख्याने येऊ लागला. व म्हणून या काळच्या ग्रंथांत परमात्म्याच्या अस्तित्वाची प्रमाणे बाक्लेने जास्त जोराने पुढे मांडली. उदाहरणार्थ, या जगाच्या रचनेत किती चातुर्य व कुशलता भरली आहे. यावरून या जगाचा आदिकर्ता हा कसा सर्व शक्तिमान सर्वज्ञ आहे हे प्रमाण बार्क्लेने मोठया सुंदर रीतीने आपल्या ग्रंथांत ग्रंथित केले आहे.
{{gap}}त्याचे दुसरें प्रमाण अशा तऱ्हेचे आहे, मनुष्याला स्वतःचा आत्मा इंद्रियांनी दिसत नाही तर त्याची प्रतीती स्वयंस्फूर्तीने होते, परंत मनुष्याला दुसऱ्या आत्म्याचे ज्ञान फक्त अनुमानाने होते. कारण आत्मा ही प्रत्यक्ष दृश्य वस्तु नाही. आता आपण आपल्या व्यतिरिक्त आत्म्याच्या<noinclude>{{center|७७}}</noinclude> j4u3757i8mrvxrt4rb9j280mfqycxr6 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८४ 104 110333 229936 2026-05-09T06:54:38Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "अस्तित्वाचे अनुमान कोणत्या खुणांवरून करतो ? आपल्याला इच्छाशक्ति आहे, आपण काही गोष्टी स्वतः होऊन करूं शकतों; आपली कृत्ये सहेतुक केलेली असतात. अशाच तऱ्हेचे वर्तन दुसरे लोक करतांन..." 229936 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>अस्तित्वाचे अनुमान कोणत्या खुणांवरून करतो ? आपल्याला इच्छाशक्ति आहे, आपण काही गोष्टी स्वतः होऊन करूं शकतों; आपली कृत्ये सहेतुक केलेली असतात. अशाच तऱ्हेचे वर्तन दुसरे लोक करतांना आपण पाहतो. यावरून ते ज्ञानी व शक्तिमान आत्मे आहेत असें आपण अनुमान करतो. ते दुसरे आत्मे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत,पण त्या आत्म्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला ओळखतां येतात. आतां याच तऱ्हेनें सृष्टीच्या मूळाशी असलेल्या परमात्म्याच्या अस्तित्त्वाचे आपल्याला अनुमान करतां ते. सृष्टीचा क्रमही इतर बुद्धिमान मनुष्याच्या वर्तनक्रमाप्रमाणे सहेतुक, बुद्धिपुरस्सर व युक्तीने व नियमित पणे चाललेला दिसतो.या खुणांवरून आपल्याला सृष्टी कत्यांच्या कर्तृत्वाबद्दल अनुमान करता येते. सारांश जितक्या खातरीपूर्वक व ज्या अर्थाने आपल्याला दुसऱ्यांच्या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल ज्ञान होते तितक्याच खातरीपूर्वक व त्याच अर्थाने आपल्याला परमात्म्याच्या अस्तित्वाचे ज्ञान होते व जर आपण दुसरे आत्मे प्रत्यक्ष पाहतों असें म्हटले तर आपण परमेश्वर पाहतो असें म्हणण्यास हरकत नाही, कारण दुसरे आत्मे व परमेश्वर हे दोन्ही अमूर्त आहेत व त्या दोघांचे ज्ञान आपल्याला सारख्या तऱ्हेने होते. असो.
{{gap}}सारांश, बार्क्लेच्या या मध्यकालीन तत्वज्ञानांत त्याचा भर जड सृष्टीचा अभाव दाखविण्यावर नव्हता. तर त्या तत्वज्ञानाची भर परमेश्वराचे स्वरूप व त्याचे अस्तित्व हे शाबीत करण्याचा होता व तो बार्क्लेनें चांगल्या रीतीने पार पाडला.
{{gap}}पुढे दहा वर्षे बार्क्लेमें तत्वज्ञानविषयक ग्रंथ लिहिला नाही. त्याचा शेवटला तत्वज्ञानविषयक ग्रंथ 'सांखळी' हा होय. हा बार्क्लेने आपल्या साठाव्या वर्षी लिहिला. मागे सांगितल्याप्रमाणे या ग्रंथांत वैद्यकविषयक व तत्वज्ञानविषयक विचारांचे विलक्षण मिश्रण झाले आहे. त्यांत डामराच्या सर्वरोगशमनक्षमत्वापासून प्रारंभ करून या विशेषाचे कारण शोधतां शोधतां बार्क्ले सृष्टीच्या मूळाकडे गेला आहे व हे मूळ म्हणजेच सर्वशक्तिमान,<noinclude>{{center|७८}}</noinclude> 5aa89k9q3qoynba1sqxcul0k6iep9zk पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८५ 104 110334 229937 2026-05-09T06:55:20Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सर्वज्ञ, सर्वगुणवान असा परमेश्वर आहे असे त्याने प्रतिपादन केले आहे.सर्व - सृष्टि या परमेश्वराच्या इच्छा व बुद्धि यांचा विकास होय. सृष्टीचे इंद्रियांना गोचर होणारे स्वरूप हे खरे..." 229937 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>सर्वज्ञ, सर्वगुणवान असा परमेश्वर आहे असे त्याने प्रतिपादन केले आहे.सर्व - सृष्टि या परमेश्वराच्या इच्छा व बुद्धि यांचा विकास होय. सृष्टीचे इंद्रियांना गोचर होणारे स्वरूप हे खरे स्वरूप नव्हे, तर इंद्रियांनी दिलेल्या संवेदनांच्या आंत मानवी बुद्धाला पटणारे असें बौद्धिक स्वरूप आहे व हे स्वरूपच खरें होय व हे स्वरूप म्हणजे परमेश्वराचे शाश्वत विचार होत. या ग्रंथांत बार्क्लेच्या मनावर प्लेटो या तत्ववेत्त्याच्या विचारांचा फार परिणाम झालेला आहे असे पदोपदी दृष्टोत्पत्तीस येते. सारांश बार्क्लेला आता जगाकडे दोन दृष्टीने पहावेसे वाटे, एक इंद्रियहष्टि व दुसरी बौद्धिक दृष्टि. व जगाला दोन स्वरूपे आहेत, असें तो आतां प्रतिपादन करूं लागला.
{{gap}}बार्क्लेच्या तत्वज्ञानाचे इतके विवेचन पुरे आहे. यापेक्षा जास्त खोल पाण्यांत शिरण्यांत अर्थ नाही. बार्क्लेच्या तत्वविचारांत एकसारखा बदल होत गेलेला आहे असें वरील विवेचनावरून दिसून येईल. पूर्ववयांत व उमेदर्दीत बार्क्ले हा ज्ञानाच्या स्वरूपासंबंधाने संवेदनावादी ( sensationa. list ) होता व यामुळे तो इंग्रज तत्वज्ञानी लॉक याच्या मताचा अनवादक होता असे म्हटले तरी चालेल. या बार्क्लेच्या पूर्ववयांतील तात्विक विचारांच्या पुढची पायरी ह्यूम या तत्वज्ञान्याने स्वीकारून लॉक व बार्क्ले यांच्या तात्विक विचारांवरून संशयवाद असा निष्पन्न होतो हे दाखविलें म्हणन तत्वज्ञानाचे इतिहासकार लॉक, बार्क्ले व ह्यूम अशी तत्वज्ञान्यांची परंपरा लावतात. बार्क्लेच्या मध्ययुगीन तात्विक विचारांचे साम्य रीड या स्कॉटिश तत्वज्ञान्याच्या विचारांशी आहे असे दिसते व त्याच्या उत्तर वयांत तो प्लेटो या तत्वज्ञान्याच्या विचारांच्या नजीक येत चालला होता असे दिसते. सारांश, बार्क्ले हा आमरणांत तत्वज्ञानाचा विद्यार्थी होता व त्याच्या विचारांची सारखी परिणति होत होती व म्हणून बार्क्लेचे तत्वज्ञान म्हणजे यरोपच्या अर्वाचीन तत्वज्ञानाची लहान आवृत्तिच होय असे म्हटलेले आहे व त्यांत बराच तथ्यांश आहे असे वरील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानात येईल.{{nop}}<noinclude>{{center|७९}}</noinclude> sk3nell0uqbiqv5inr81j5bxg2t045z