विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.9 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf 106 1874 232800 232778 2026-07-01T10:40:27Z कल्पनाशक्ती 3813 232800 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} pv38hnpnrsj71fnmm8g1rzcq5iejblr 232803 232800 2026-07-01T10:52:26Z कल्पनाशक्ती 3813 232803 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} ndxq3ed2k33oihlpthzm276myzqy2ku 232810 232803 2026-07-01T11:26:02Z कल्पनाशक्ती 3813 232810 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=X |Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} g9a44o7uhit45ol365nz6zsdsp9kuj4 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४१ 104 66604 232798 161080 2026-07-01T10:27:49Z कल्पनाशक्ती 3813 232798 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|३६|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[नवम}}</noinclude>द्यांतून आपणास दिसलें म्हणजे त्या पडद्याच्या पातळपणाच्या परिमाणानुरूप त्याला आपण बरें, मध्यम, चांगलें अशी नांवें देतों; आणि त्याच रूपासमोर जाड पडदा असला म्हणजे त्याचे रूप अत्यंत अंधुकपणे आपल्या प्रत्ययास येते आणि त्यालाच आपण वाईट म्हणतों. चांगले आणि वाईट या दोन प्रकारच्या दोन समजुती अथवा भावना आहेत. या समजुती द्वैत बुद्धीमुळे उत्पन्न झालेल्या आहेत. द्वैत दिसणे हेच पहिले खूळ आहे. या खुळाने आपल्या मनाला एकवार पछाडले की तेथे दुसरी लहान मोठी अनेक खुळे निर्माण होतात. या खुळांपासून अनेक प्रकारची शब्दसृष्टि निर्माण होते. ही सृष्टि मनुष्याच्या हृदयांत वास करते. आणि अखेरीस त्याच घराचे स्वामित्व पटकावून वाटेल तसा धिंगाणा ती तेथें घालू लागते. मग ती कोणाला क्रूर पशु बनविते, कोणाच्या हृदयांत द्वेषाची रोपे लावते, आणि कोणाच्या मनांत मत्सराचे बीज पेरते. बरें आणि वाईट या दोन कल्पना आपल्या बाल्यावस्थेपासूनच आपणास पछाडीत असतात; आणि मूर्खत्वाच्या कल्पनांतून पुढे मत्सरादि विकार निर्माण होऊन आपल्या जन्माचें मातेरे करून टाकतात. मनुष्यजातीबद्दलच्या आपल्या साऱ्या कल्पना विकृत होतात, आणि या स्वर्गरूपी जगाला नरकाचे रूप आपण प्राप्त करून देतो. चांगले आणि वाईट या द्वैताचा नाश ज्या क्षणी आपल्या चित्तांतून होईल, त्याच क्षणीं या पृथ्वीचें रूपांतर स्वर्गात होईल.
{{gap}}"ही सारी सृष्टि अत्यंत मधुर आहे. ती सर्व प्राण्यांना मधुर आहे व सर्व प्राणी तिला मधुर आहेत. ही सारी परस्परांची पोषक आहेत. या सर्वांत जें माधुर्य आहे तें आत्म्याचे आहे. तें माधुर्य तोच आहे. तो स्वयंप्रकाश असून अनंत आहे. या जगाच्या पोटी त्याची वस्ती आहे. हे माधुर्य कोणाचे? त्या अनंत रूपावांचून माधुर्य कोठचे? तें एकच माधुर्य अनेक रूपांनी विलसत आहे. जेथे जेथें थोडें बहुत माधुर्य-प्रेम आढळेल तेथे तेथे तें त्याचंच स्वरूप आहे. तें प्रेम, तें माधुर्य तोच आहे. मग ते प्रेम साधुसंतांच्या ठिकाणी असो, पापी मनुष्याच्या ठिकाणीं असो, देवदूतांच्या ठिकाणी असो, अथवा ते एखाद्या खुनी मनुष्याच्या ठिकाणी असो; तें माधुर्य तोच आहे. तें माधुर्य देहांत असो, मनांत असो अथवा इंद्रियांत असो; तें माधुर्य तोच आहे. देहद्वारा अनुभवास येणाऱ्या आनंदांत त्याचाच वास<noinclude></noinclude> 9svgp3p81w8ufinlitbfhj2tumjgskf पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४३ 104 66605 232799 161082 2026-07-01T10:37:54Z कल्पनाशक्ती 3813 232799 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|३८|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>या देहांतही आहे. सर्व प्राण्यांची जीवनकला या रूपाने तोच आविर्भूत होत आहे. तोच व्यक्तदशेला येत आहे. हा सूर्य सर्व प्राण्यांना अत्यंत प्रिय आहे, आणि त्याचे प्रेमही सर्व प्राण्यांवर तसेंच आहे. या सूर्याच्या अंतरंगांत जे स्वयंप्रकाश ब्रह्म आहे तेंच अंशतः आमच्यांतही परावर्तन करीत आहे. आम्ही सारे लहान लहान आरसे असून त्यांत तोच स्वयंप्रकाश बिंबला आहे! त्याचे प्रतिबिंब ज्यांत नाही असे कोणतें जीवित आहे? जीत तो प्रकाशत नाही अशी, कोणती वस्तु आहे? आमच्या देहांत तेंच स्वयंप्रकाश ब्रह्म आहे आणि त्याच्याचमुळे आमच्या डोळ्यांस प्रकाश पाहण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा चंद्र सर्व प्राण्यांना प्रिय आहे आणि तोही सर्व प्राण्यांवर प्रेम करतो; पण या चंद्राचा अंतरात्मा जे स्वयंप्रकाश ब्रह्म, जे अनंत आणि अमर आहे तेच आमच्या देहांत मन या रूपाने आविष्कृत होत आहे. ही विद्युत् किती प्रकाशशाली आणि सुंदर आहे पहा! सर्व प्राण्यांवर तिचे प्रेम आहे आणि सर्व प्राणी तिजवर प्रेम करतात; पण या विद्युत् शक्तीचा अंतरात्मा कोण म्हणाल तर तो तेंच स्वयंप्रकाश ब्रह्म. तेंच स्वयंप्रकाश ब्रह्म आमच्यांतही आहे. कारण 'सर्वं खल्विदं ब्रह्म' मनुष्याचे प्रेम सर्व प्राण्यांवर आहे आणि सर्व प्राणीही मनुष्यावर प्रेम करतात. मनुष्याचा अंतरात्मा म्हणजे तेंच स्वयंप्रकाश ब्रह्म. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' सर्व प्राण्यांचे अधिष्ठान हेच ब्रह्म आहे."
{{gap}}हे सारे विचारतरंग किती उदात्त, काव्यमय आणि उपयुक्त आहेत पहा! हे सारे विचार ध्यान करण्यासाठी आहेत. चित्तांत सदोदित चिंतन करावें अशा योग्यतेचे ते आहेत. फार कशाला, या पृथ्वीचेंच चिंतन तुह्मी करा, आणि त्याच वेळी हेही लक्ष्यात बाळगा की या पृथ्वीच्या अंतरात्म्यांत ज्या स्वरूपाचा वास आहे तेच आमच्यांत वसत आहे. ही पृथ्वी आणि आम्ही ही दोन्ही वस्तुतः एकच आहेत. पृथ्वी ही देह आणि जीवात्मा हाच परमात्मा. पृथ्वीच्या विशाल देहामागे जसा विशाल परमात्मा त्याचप्रमाणे या लहानशा जड देहामागे जीवात्मा आहे. या वायूच्या ठिकाणी जे ब्रह्मरूप आहे तेंच मजमध्येही आहे. ही सारी एकाच अनंताची अनेक रूपे आहेत. एकच अनंत ब्रह्म अनेक रूपांनी व्यक्त झाले आहे.
{{rule|5em}} {{nop}}<noinclude></noinclude> awrzx5q4v1hcoxohddpomy0p27t4p20 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/४४ 104 66606 232801 161083 2026-07-01T10:43:11Z कल्पनाशक्ती 3813 232801 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|सांख्यविचार.|३९}}</noinclude>{{x-larger|{{center|'''४'''
'''सांख्यविचार.'''}}}} {{rule|7em}}
{{gap}}प्रकृतीला अव्यक्त असें नांव सांख्य तत्त्वज्ञांनी दिले आहे. अव्यक्त म्हणजे सर्व घटकांची साम्यावस्था. अव्यक्तांत जे वेगवेगळे घटक असतात, त्यांपैकी कोणाचे आधिक्य नसतां सर्व समप्रमाण असण्याची जी अवस्था ती प्रकृति अथवा अव्यक्त. सर्व गुणांची पूर्ण साम्यावस्था असेल,अशा वेळी असल्याहि प्रकारची गति असणे शक्य नाही हे उघडच आहे. ज्यावेळी कोणत्याही प्रकारचे व्यक्त रूप प्रकृतीला नसते, अशा अगदी प्रथमावस्थेत कोणत्याही प्रकारची गति नसते आणि अशा वेळी ती अविनाशीही असते; कारण विघटना अथवा मृत्यु यांची उत्पत्ति असमता आणि अदलाबदल यांमुळे होत असते. परमाणुवाद्यांच्या मताप्रमाणे सर्व सृष्टीचें आदिकरण परमाणु हे आहे; पण हे मत सांख्यांना मान्य आहे. परमाणु ही प्रथमावस्था नव्हे असे सांख्यमत आहे. हे विश्व परमाणूंतून उत्पन्न होत नाही. परमाणु ही फार तर द्वितीय अथवा तृतीय अवस्था असे सांख्यांचें म्हणणे आहे. आदिबीजापासून परमाणु उत्पन्न होणे शक्य आहे इतकेंच सांख्यवादी कबूल करतात. आदिबीजापासून परमाणु उत्पन्न होऊन परमाणूच्या कमी अधिक संघटनेने लहानमोठे पदार्थ निर्माण होतात. अर्वाचीन भौतिकशास्त्रांच्या दृष्टीने विचार करतां तीही सांख्यमतालाच अखेरीस पुष्टि देतील असा स्पष्ट संभव दिसतो. त्यांच्या वाढीचा आजचा झोंक सांख्यमताकडेच आहे. ईथर (Ether) अथवा आकाश हा मूळ पदार्थ आहे असें अर्वाचीन शास्त्र म्हणतें. ईथर हा अनेक परमाणु मिळून झाला आहे असें म्हणतां येत नाहीं; कारण तसे असेल तर त्यांत दुसरा कोणताही पदार्थ पूर्णपणे मिसळला जाणार नाही. हवा ही अनेक परमाणू मिळून झाली आहे. ईथरचे अस्तित्व सर्वत्र आहे हे आपणांस ठाऊक आहेच. सर्व पदार्थांस ईथर अंतर्बाह्य व्यापून आहे, आणि हवेचे परमाणूही त्यांत तरंगत आहेत. आतां स्वतः ईथरही अनेक परमाणूंचा बनला आहे, असें म्हणावें तर त्यांतील दोन परमाणूंत मोकळी जागा राहणारच. मग ही मोकळी जागा कशाने भरली असेल. ही जागा अधिक सूक्ष्म स्वरूपाच्या<noinclude></noinclude> lmvdi5iut9t4z22sw1ufol8x84ed5wa 232802 232801 2026-07-01T10:43:40Z कल्पनाशक्ती 3813 232802 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|सांख्यविचार.|३९}} {{rule}}</noinclude>{{x-larger|{{center|'''४'''
'''सांख्यविचार.'''}}}} {{rule|7em}}
{{gap}}प्रकृतीला अव्यक्त असें नांव सांख्य तत्त्वज्ञांनी दिले आहे. अव्यक्त म्हणजे सर्व घटकांची साम्यावस्था. अव्यक्तांत जे वेगवेगळे घटक असतात, त्यांपैकी कोणाचे आधिक्य नसतां सर्व समप्रमाण असण्याची जी अवस्था ती प्रकृति अथवा अव्यक्त. सर्व गुणांची पूर्ण साम्यावस्था असेल,अशा वेळी असल्याहि प्रकारची गति असणे शक्य नाही हे उघडच आहे. ज्यावेळी कोणत्याही प्रकारचे व्यक्त रूप प्रकृतीला नसते, अशा अगदी प्रथमावस्थेत कोणत्याही प्रकारची गति नसते आणि अशा वेळी ती अविनाशीही असते; कारण विघटना अथवा मृत्यु यांची उत्पत्ति असमता आणि अदलाबदल यांमुळे होत असते. परमाणुवाद्यांच्या मताप्रमाणे सर्व सृष्टीचें आदिकरण परमाणु हे आहे; पण हे मत सांख्यांना मान्य आहे. परमाणु ही प्रथमावस्था नव्हे असे सांख्यमत आहे. हे विश्व परमाणूंतून उत्पन्न होत नाही. परमाणु ही फार तर द्वितीय अथवा तृतीय अवस्था असे सांख्यांचें म्हणणे आहे. आदिबीजापासून परमाणु उत्पन्न होणे शक्य आहे इतकेंच सांख्यवादी कबूल करतात. आदिबीजापासून परमाणु उत्पन्न होऊन परमाणूच्या कमी अधिक संघटनेने लहानमोठे पदार्थ निर्माण होतात. अर्वाचीन भौतिकशास्त्रांच्या दृष्टीने विचार करतां तीही सांख्यमतालाच अखेरीस पुष्टि देतील असा स्पष्ट संभव दिसतो. त्यांच्या वाढीचा आजचा झोंक सांख्यमताकडेच आहे. ईथर (Ether) अथवा आकाश हा मूळ पदार्थ आहे असें अर्वाचीन शास्त्र म्हणतें. ईथर हा अनेक परमाणु मिळून झाला आहे असें म्हणतां येत नाहीं; कारण तसे असेल तर त्यांत दुसरा कोणताही पदार्थ पूर्णपणे मिसळला जाणार नाही. हवा ही अनेक परमाणू मिळून झाली आहे. ईथरचे अस्तित्व सर्वत्र आहे हे आपणांस ठाऊक आहेच. सर्व पदार्थांस ईथर अंतर्बाह्य व्यापून आहे, आणि हवेचे परमाणूही त्यांत तरंगत आहेत. आतां स्वतः ईथरही अनेक परमाणूंचा बनला आहे, असें म्हणावें तर त्यांतील दोन परमाणूंत मोकळी जागा राहणारच. मग ही मोकळी जागा कशाने भरली असेल. ही जागा अधिक सूक्ष्म स्वरूपाच्या<noinclude></noinclude> 9267e53cf4qe1f2wf06tdc6dy9zbxa1 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६५ 104 66627 232804 162034 2026-07-01T11:00:10Z कल्पनाशक्ती 3813 232804 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|६०|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>चकबुद्धीस शक्य दिसत नसल्यामुळे या एका बाबींत मात्र सांख्यमताशी आमचा विरोध आहे. या प्रश्नांना अधिक चांगले आणि समाधानकारक उत्तर आपण शोधू लागलों म्हणजे आपण अद्वैतापर्यंत येऊन पोहोचतों. प्रकृति आणि पुरुष ही दोन अनंतरूपें कशी असू शकतील ? या बाबींत सांख्यशास्त्र अपूर्ण राहिले आहे असे म्हणणे आम्हांस भाग आहे. त्यांच्या या उत्तराने आमचे पूर्ण समाधान होत नाही. येथपासून पुढे वेदान्ताने आपला मार्ग चाचपडत पुढे कसा काढला आणि सांख्यशास्त्रांत राहिलेले न्यून त्याने पूर्ण कसे केले याचा विचार आपण पुढे मागे लवकरच करूं; पण वेदान्ताने हे शास्त्र पूर्णतेस नेले असले तरी पहिल्या मानाची जागा सांख्यशास्त्रालाच देणे भाग आहे. या मार्गात सांख्यशास्त्राने जी बिनमोल कामगिरी बजावली आहे, तिचे महत्त्व कमी होत नाही हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. इमारत एकदां पूर्ण झाली म्हणजे तीवर अखेरचा एखादा हात फिरवून ती अधिक शोभायमान करणे हे काम फारसे अवघड नाही.
{{rule|5em}}
{{x-larger|{{center|'''५'''
'''सांख्य आणि वेदान्त.'''}}}} {{rule|7em}}{{rule|7em}}
{{gap}}सांख्यशास्त्राच्या विचारसरणीत उणीव कोठे आहे आणि तिची पूर्तता वेदान्तानें कशी केली आहे याचा विचार आज आपण करणार आहों; पण या आजच्या विषयास आरंभ करण्यापूर्वी सांख्यशास्त्राच्या मुख्य मुद्यांचे पर्यालोचन थोडक्यांत करणे वावगे होणार नाही. प्रकृति ही या साऱ्या दृश्य विश्वाचे कारण आहे असे सांख्यशास्त्राचे मत असल्याचे तुमच्या लक्ष्यांत असेलच. विचार, बुद्धि, विवेचकवुद्धि, प्रेम, द्वेष, इत्यादि भावना आणि तसेंच स्पर्श, रूप, रस आणि जड वस्तु ही प्रकृतींतून निर्माण झालेली आहेत असें सांख्य मत आहे. सृष्टीतील यच्चयावत् वस्तु प्रकृतीतून निर्माण झालेली आहे. ही प्रकृति त्रितत्त्वात्मक असून त्यांची नांवें सत्व, रज आणि तम अशी आहेत. सत्व, रज आणि तम ही तीन मूलतत्त्वे आहेत. हे तीन गुण<noinclude></noinclude> nzgmwwb1xzg2iuzrtaxd745qqldigo1 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/६७ 104 66629 232805 162036 2026-07-01T11:09:16Z कल्पनाशक्ती 3813 232805 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|६२|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[नवम}} {{rule}}</noinclude>धारानेच चालते, आणि मन अथवा अंतरिंद्रियें प्राणांवर क्रिया करीत असतात. येथवर सांख्यशास्त्राने केलेले वर्णन सर्वस्वी सयुक्तिक आहे. येथवर सूक्ष्मेंद्रियांच्या ज्या क्रिया सांख्यशास्त्राने वर्णन केल्या आहेत, त्या अगदी विवेचकबुद्धीस अनुसरून असून तर्कशास्त्रासही संमत अशा आहेत. या बाबींत सांख्यशास्त्राने कसल्याही प्रकारचा बोबडेपणा ठेवला नसून सर्व विवेचन अगदी मुद्देसूद आणि रेखीव असें केले आहे. सांख्यशास्त्र हे जगांतलें प्राचीनतम सूक्ष्मेंद्रियशास्त्र आहे ही गोष्ट मनांत आली म्हणजे साहजिकपणे आपण आश्चर्याने थक्क होऊन जातो. तत्त्वज्ञानाचा अथवा बुद्धिवादाचा उगम जगांत जेथे जेथे झाला आहे, तेथे तेथें श्रीकपिलांचे शास्त्र अंशतः तरी दृष्टीस पडल्यावांचून राहावयाचें नाही. जगांतील प्रत्येक पंडित या दृष्टीने कपिलांचा ऋणी आहे. पायथागोरासने या ज्ञानाचा अभ्यास हिंदुस्थानांत केला आणि त्याचा फैलाव त्याने ग्रीस देशांत केला. यानंतर याच ज्ञानाचा अंश प्लेटोला प्राप्त झाला. पुढे ईश्वरवाद्यांनी हे ज्ञान आलेक्झांड्रियांत नेलें; आणि अलेक्झांड्रियांतून त्याचा प्रसार युरोपांत झाला. अशा रीतीने तत्त्वविचार जेथे जेथें प्रचलित झाला आहे, तेथे तेथे या आदिदर्शनकाराचे ऋण आहे असे म्हणावयास हरकत नाही.
{{gap}}कपिलकृत दर्शनाचा जो विचार आपण येथवर केला, त्यावरून त्यांचे शास्त्र सुसंगत आहे असे म्हणावयास हरकत नाही; पण आता यापुढे मात्र त्यांच्याशी आपला मतभेद होणार आहे. याच विचारसरणीच्या मार्गाने आपण पुढे पाऊल टाकू लागलों म्हणजे आपल्या मतभेदास सुरवात होणार आहे. श्रीकपिलांच्या दर्शनाचा मुख्य पाया म्हटला म्हणजे उत्क्रांति हा आहे. एका पदार्थाचे उत्क्रमण होऊन त्यांतून दुसरा पदार्थ निर्माण होतो, या मूलभूत सिद्धांताच्या पायावर आपल्या शास्त्राची उभारणी कपिलांनी केली आहे. 'कारण' या शब्दाची जी व्याख्या त्यांनी केली आहे, तीवरून सुद्धा माझ्या या म्हणण्याचे प्रत्यंतर आपणांस दिसेल. ते म्हणतात "कारण म्हणजे जें रूपांतराने आकार बदलून कार्यरूप घेतें तें." विश्वरचनेचे जे वर्णन त्यांनी केले आहे त्यावरूनही याच म्हणण्याला पुष्टि मिळते. एकाच वस्तूची रूपांतरे होत होत सारे विश्व स्पष्टत्वास कसे आले, याचा विचार आपण पूर्वी केलाच आहे तो ध्यानांत आणा. आपल्यासमोर आपणास माती दिसत असते.<noinclude></noinclude> c2nlqj3oaagy6s7wjxhjuquzfyy6y2e पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७४ 104 66636 232806 162043 2026-07-01T11:12:00Z कल्पनाशक्ती 3813 232806 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|सांख्य आणि वेदांत.|६९}} {{rule}}</noinclude>{{gap}}माझ्या ठिकाणी जाणीव म्हणून जे काही आहे ते तीन प्रकारच्या स्वरूपाचे आहे असें वेदान्ताचे मत आहे. ही तीन रूपें सत् , चित् आणि आनंद ही होत. मला कशाचीही गरज नाही, मी शांत आहे, स्वस्थ आहे, माझ्या शांतीचा भंग कोणीही करू शकत नाही अशा प्रकारचे कल्पनातरंग आपल्या चित्तांत कधीमधी वावरतांना आढळतात. अशा प्रकारची 'मी गरजेच्या पलीकडचा आहे' ही भावनाच आपल्या जीवनाचा पाया आहे. आपल्या साऱ्या जीवनाचा मध्यवर्ती बिंदु हाच असून याभोंवतीं आपल्या एकंदर जीवनक्रमाचे रहाटगाडगें चालू आहे. ही भावना मर्यादित झाली म्हणजे इतर वस्तूंशी ती मिश्र होते आणि अमूर्तातून मूर्तरूपाला येते. सत् , चित् आणि आनंद ही त्रिविध भावना मूळ अरूप असते आणि तीच पुढे प्रत्यक्षत्वास येते. हीच भावना अस्तित्वरूप, ज्ञानरूप आणि प्रेमरूप धारण करते. प्रत्येकाला अस्तित्व आहे. सत् या अव्यक्त स्वरूपाचें हें व्यक्तरूप आहे. प्रत्येकाला ज्ञान आहे.चित् या अव्यक्त रूपाचें ज्ञान व्यक्तरूप आहे. त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या ठिकाणी प्रेम आहे. हे आनंदरूपाचें व्यक्तरूप होय. ज्याच्या अंतःकरणांत प्रेमाचा लेश नाही असा प्राणी तुम्हांस आढळावयाचा नाही. तें व्यक्तरूपाने दिसण्याचे मार्ग आणि परिस्थिति ही भिन्न असतील; तथापि प्रेमशून्य असा प्राणी एकही नाही. कोठे तरी तें व्यक्त करण्यावांचून त्याला गत्यंतरच नाही. अत्यंत क्षुद्र कीटकापासून तो थेट देवाधिदेवापर्यंत प्रेमाची व्याप्ति सर्वत्र आहे. अंतःसृष्टीच्या ज्या स्वयंभू रूपाला 'य' ही संज्ञा आपण दिली होती त्यालाच सच्चिदानंद अशी संज्ञा वेदान्ताने दिली आहे; आणि याच मूळरूपाशी मनाचे मिश्रण झाले म्हणजे तें अस्तित्व ज्ञान आणि प्रेम या रूपाने दिसू लागते. मूळचें सच्चिदानंद रूप अमर्याद आणि स्वयंभू आहे. कोणत्याही दोन पदार्थांच्या मिश्रणानें तें बनलेले नाही. त्याचप्रमाणे त्या रूपांत कधी बदलही होत नाही. तें स्वयमेव असल्यामुळे दुसऱ्या पदार्थाची क्रिया त्याजवर घडू शकत नाही. आत्मरूप तें हेच. हेच आत्मरूप मनाशी मिश्र झाले की ते मर्यादित होऊन त्यालाच आपण व्यक्ति असे म्हणतों. हेच रूप सृष्टीत अनेक रूपांनी व्यक्तदशेला आलेले असते. कोठे झाडझुडुप या रूपाने तर दुसऱ्या कोठें कीटकाच्या रूपाने आणि तिसऱ्या ठिकाणी मनुष्याच्या रूपाने हेच आत्मरूप व्यक्तपणास येतें. ज्याप्रमाणे हे महदाकाश कोठे घटाच्या तर<noinclude></noinclude> 7htb8t0yp80mgsx35euspyu6zigv2td पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/७९ 104 66641 232807 162049 2026-07-01T11:15:11Z कल्पनाशक्ती 3813 232807 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|७४|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>घटक मिळून आपले मन झाले आहे. या तिहींस अस्तित्व नसेल तर मनपण म्हणून जो भाव आहे तो कधीही अस्तित्वात आला नसता. या तिहींचें जें समवायीरूप तेंच मन. कालकल्पना अगोदर असल्याशिवाय कोणत्याही वस्तूबद्दल विचार करणे तुम्हांस शक्य नाही. त्याचप्रमाणे देशकल्पनेशिवाय कोणत्याही वस्तूची कल्पना तुम्हास करता यावयाची नाही. कोणतीही वस्तु तुम्ही चित्तांत आणून पहा, म्हणजे तिचे निवासस्थान अगोदर तुमच्यापुढे उभे राहते. त्याचप्रमाणे कारणावांचून कार्य असल्याचे आपल्या मनात कधीच येत नाही. अमुक एक वस्तु कार्यरूप आहे असें मनांत आल्याबरोबर तिचें काही तरी कारण असलेच पाहिजे असें आपोआपच आपल्या मनांत येतें. कारणावांचून कार्य नाही हा सिद्धांत आपल्या मनाने पक्का ठरविला आहे. अशा प्रकारे आपले मन त्रिविधरूप आहे. आपल्या एकाच मनाची ही तीन रूपं आहेत असे म्हणा; अगर ही तीन रूपे मिळून आपले मन होते असे म्हणा. हे तीन घटक ज्या क्षणीं अस्तित्वांतून जातील त्याच क्षणी आपले मनही नाहीसे होईल. यामुळे काल, देश आणि कारण या त्रिविध घटकांचे मनाच्या योगाने सर्व प्रकारचे भेद उत्पन्न झाले आहेत. याच मनानें 'क्ष' आणि 'य' या वस्तूंचा दृश्याभास उत्पन्न केला असून त्यानेच ही बाह्यसृष्टि आणि अंतःसृष्टीही निर्माण केली आहे. 'क्ष' ही बाह्यसृष्टि आहे ही मनाची कल्पना आणि 'य' ही अंतःसृष्टि आहे हीसुद्धा मनाचीच कल्पना आहे, असें वेदान्तशास्त्राचे म्हणणे आहे; पण वस्तुतः 'क्ष' आणि 'य' या दोन्ही वस्तू मनाच्या हद्दीच्या पलीकडच्या असल्यामुळे त्यांच्यात खरोखर भेदच नाहीं; आणि असा भेद नसल्यामुळे त्या अभेद म्हणजे एकरूप आहेत. मनाची हद्द सुरू झाल्यावांचून भेदाला अस्तित्व नाही पण मनाच्या हद्दीपलीकडे त्याला अस्तित्व असणे शक्य आहे. 'क्ष' आणि 'य' वस्तूंना अमुक गुण आहेत असेंही आपणास म्हणतां येत नाही. कारण गुण कल्पना हासुद्धा मनाचाच धर्म आहे. ज्या दोन वस्तूंत कोणताच गुण नाहीं त्या एकरूप असल्याच पाहिजेत. कारण त्यांच्यांतील भेद गुणधर्मांच्या भिन्नतेमुळेच उत्पन्न झालेला असतो. यामुळे जेथे कोणता गुणच नाही तेथें अभेद असलाच पाहिजे. 'क्ष' या वस्तूला स्वतःचा असा कोणताच गुण नाही. अमुक एक गुण तिला आहे असा आरोप मनाने तिजवर केलेला असतो.<noinclude></noinclude> damqmi4wexfq4aw6tym91mu9sitcx7p पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८० 104 66642 232808 162050 2026-07-01T11:17:00Z कल्पनाशक्ती 3813 232808 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|सांख्य आणि वेदांत.|७५}} {{rule}}</noinclude>तिने आपला गुण मनापासून उसना घेतलेला असतो. हाच न्याय 'य' या वस्तूलाही लागू आहे. याकरिता या दोन्ही वस्तू निर्गुण असल्यामुळे एक रूप आहेत. अशारीतीने अंतर्बाह्य सारे विश्व एकरूपच आहे. विश्वांत आत्मरूप म्हणून जे आहे तें एकच आहे. विश्वांत सारें अस्तित्व एकरूप आहे. तें एकच आहे, आणि देश, काल व कारण या उपाधीच्या द्वारे ते स्पष्टत्वास येते तेव्हां त्या एकासच अनेक नांवें प्राप्त होतात. बुद्धि, सूक्ष्म तत्त्वे, जड तत्त्वे, मन इत्यादि अनेक नांवें या एकाच अस्तित्वाला अशा प्रकारे प्राप्त झाली आहेत. विश्वांत जे काही आहे तें सारें एकच आहे, आणि तें एकच अनेक प्रकारच्या रूपांनी दिसते. त्या अनंत अस्तित्वाचा अल्पसा अंश काल, देश आणि कारण या उपाधीच्या जाळ्यांत सांपडतो आणि अनेक प्रकारच्या आकारांनी तो दिसू लागतो. त्याजभोंवतीं हे जाळे पसरलें म्हणजे जें एक शिल्लक उरतें तेंच ब्रह्म अथवा आत्मरूप. हे आत्मरूप विश्वदेहाच्या अधिष्ठानी राहून त्याचे शासन करतें तेव्हां त्याला परमेश्वर असें नांव प्राप्त होते; आणि हेच आत्मरूप या लहानशा विश्वाच्या म्हणजे एका देहाच्या अधिष्ठानी असते तेव्हां तेंच जीवात्मा म्हणविते. मनुष्यांतील जीवात्मा हेच त्याचे परमात्मरूप होय. अशा रीतीनें साऱ्या विश्वांत एकच पुरुष आहे, आणि वेदान्ताने त्याला ब्रह्म अशी संज्ञा लावली आहे. जीवात्मा आणि परमेश्वर यांजवर भासमान होणारी आवरणें काढून टाकली म्हणजे त्यांच्यांत भासमान होणारा फरक नाहीसा होऊन ते एकरूप होतील. ब्रह्माच्या ठिकाणी हा जीवात्मा आणि परमात्मा असा भेद नाही. देहाच्या उपाधीमुळे तुम्ही अल्पसे भासतां पण परमार्थदृष्ट्या तुम्ही विश्वरूप आहा. तुम्ही जेथें नाहीं असें एकही ठिकाण विश्वांत नाही. साऱ्या हस्तांनी तुम्हीच कर्मे करीत आहां. सर्व मुखांच्या द्वारे भक्षणाची क्रिया तुम्हीच करीत आहां. सर्व नासापुटांच्या द्वारे श्वासोच्छ्वासाची क्रिया तुम्हीच करीत आहां, आणि सर्व मनांच्या द्वारे विचार करण्याची क्रियाही तुम्हीच करीत आहां. सारे विश्व तुम्हीच आहां. सारे दृश्यजात हा तुमचा देह आहे. दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही प्रकारचे विश्व तुम्हीच आहां. या विश्वदेहाचा आत्मा तुम्ही आहां, आणि देहही तुम्हीच आहां. परमेश्वर तुम्ही आणि देवादिकही तुम्हीच. मनुष्य तुम्ही आणि पशूही तुम्हीच. साऱ्या<noinclude></noinclude> komuiosibwiim9qlw545zkpjswftarh पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८१ 104 66643 232809 162053 2026-07-01T11:22:39Z कल्पनाशक्ती 3813 232809 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|७६|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>विश्वांतील झाडेझुडपं आणि खनिज पदार्थसुद्धा तुम्हीच आहां. प्रत्येक वस्तूचें व्यक्तरूप तें तुम्हीच. ज्याला ज्याला अस्तित्व हा शब्द लावतां येतो तें सारें तुम्हीच आहा. तुम्ही अनंतरूप आहां. अनंताचे भाग पाडता येणे शक्य नाही. त्याला भाग असणे अशक्य आहे; कारण त्याचा भाग केला तरी तो भागही अनंतच होईल. तो अनंत झाला तर मूलवस्तु आणि तिचा भाग ही सारखींच होतील. सबंध वस्तु आणि तिचा भागही एकच आहेत हे म्हणणे बुद्धिग्राह्य नाही. याकरितां तुम्ही या अनंतवस्तूचे भाग आहो असे म्हणणे अथवा तुम्ही 'अमुक राजश्री' इतक्याच अल्परूपाचे आहां असें म्हणणे वेडेपणाचे आहे. हे म्हणणे वस्तुस्थितीस सोडून आहे. असे कोणी बोलला तर तें तो स्वप्नांत बोलत आहे असे तुम्ही समजा. हे सर्व जाणून घ्या, याचा अनुभव घ्या आणि मुक्त व्हा. साऱ्या अद्वैत वेदान्ताचा हा अखेरचा सिद्धांत आहे. ''''मनोबुद्धयहंकारचित्तानि नाहम् । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे । न च व्योम भूमिर्नतेजो न वायुः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥'''' हेच खरें ज्ञान. याखेरीज बाकी जे राहिले तें सारें अज्ञान. ज्ञान आणि मी अशा दोन भिन्न वस्तूंना अस्तित्व नाही; कारण मी ज्ञानरूप आहे. मला जीवितही नाहीं; कारण मी जीवितच आहे. मी सर्वत्र आहे- मी अस्तित्व आहे, मी एकरूप आहे. माझ्याशिवाय वेगळे अस्तित्व कोणालाही असणे शक्य नाही. सर्व भूतजात मजमध्येच आहे. सर्व भूतजात मीच आहे. सर्व भूतांच्याद्वारे मी स्पष्टत्वास येतों; तथापि त्यांच्या पाशांत मात्र मी नाही. मी मुक्त आहे. मला मुक्तीचीही जरूर नाही. मुक्तीची वाट कोण शोधतो? बद्ध असेल तो. जो बद्ध नाही त्याला मुक्तिही नको. 'मी बद्ध आहे' अशी भावना तुम्ही केली की त्याच क्षणी तुम्ही बद्ध होता आणि मग तसेच बद्ध राहता. तुम्हाला बांधणारे जाळे तुम्हीच आपल्या हाताने विणतां. ''''शिवोहम्'''' हा अनुभव एकवार तुम्हाला आला की त्याच क्षणी तुम्ही मुक्त होता. ज्ञान म्हणतात तें यालाच. ही पराविद्या. ही मुक्तिदात्री विद्या आहे. '''"हे बोलाचे नव्हे शास्त्र । पै संसारजिणते शस्त्र । आत्मा अवतरविते मंत्र ! अक्षरें इयें ॥"''' मुक्त होणे हेच साऱ्या सृष्टीचे अखेरचे साध्य आहे.
{{rule|5em}} {{nop}}<noinclude></noinclude> 63s5n6lwiwiqseo820tob6ocl1lioau पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८२ 104 66644 232811 162087 2026-07-01T11:28:42Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232811 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|वेदान्त व हक्क.|७७}} {{rule}}</noinclude>
{{x-larger|{{center|'''६
वेदान्त व हक्क.'''}}}} {{rule|7em}}{{rule|7em}}
{{gap}}अद्वैत वेदान्तापैकी सूक्ष्मेंद्रियशास्त्राचा विचार आपण बहुधा पूर्णपणे केला आहे. आता एकाच मुद्याचे विवेचन करावयाचे आहे, आणि हाच मुद्दा लक्ष्यांत येण्यास फार कठीण असा आहे. ''''एकमेवाद्वितीयम्'''' असें जें कांहीं आहे त्यापासून उत्क्रांतिद्वारा आपणाभोंवतालचे सारे विश्व निर्माण झालें आहे हा वेदान्तशास्त्राचा सिद्धांत आपणास आठवत असेलच. किंबहुना, हे सारे विश्व एकमेवाद्वितीयापासून निर्माण झाले असे म्हणण्यापेक्षां तें एकमेवाद्वितीयच उत्क्रांत होत होत विश्वरूपाला आले असें वेदान्ताचे म्हणणे आहे. या एकमेवाद्वितीयाला ब्रह्म अशी संज्ञा वेदान्तशास्त्राने दिली आहे. तें केवलरूप आहे. कोणत्याही पदार्थांच्या मिश्रणाने झालेले नाही. हेच केवलरूप सृष्टि या रूपाने प्रत्ययास येत आहे. हे घडले कसे? केवलरूपांत ही एवढी घडामोड कोणी घडवून आणली? वेदान्ताच्या साऱ्या विचारसरणींत अत्यंत अवघड अशी जागा ती हीच. केवलरूपांत घडामोड व्हावी हे आधी शक्य तरी आहे काय? बोलून चालून तें केवलरूप. तें अमिश्र आहे, अनंत आहे, अमर्याद आहे अशा प्रकारच्या त्याच्या व्याख्या तुम्हीच सांगतां; मग त्यांत बदल कशानें, कसा आणि कां व्हावा? हे रूप बदलण्यास पात्र नाही, त्याअर्थी त्यांत बदल घडणे शक्य नाही. याकरितां त्यांत बदल झाला असे तुम्ही म्हटले की तुमच्या स्वतःच्या बोलण्यांतच हा उघड विरोध उत्पन्न झाला. पृच्छकाने उभी केलेली ही अडचण मोठी विलक्षण आहे खरी. आतां व्यक्तिविशिष्ट परमेश्वराचे अस्तित्व जे मानतात त्यांच्याही मार्गात हीच अडचण आहे. त्यांना आम्हीही असा प्रश्न करूं की ही सारी सृष्टि कशी निर्माण झाली? तिला मूलद्रव्य म्हणून काही तरी असले पाहिजे हे उघड आहे. केवळ शून्यांतून ती निर्माण होणे शक्य नाही. तिच्या मुळाशी शुद्ध अभाव असेल असे मानणे तर्काला सोडून आहे. ती शून्यांतून निर्माण झाली असे मानले तर त्यांतही पूर्वीचाच विरोध आहे असे दिसून<noinclude></noinclude> kkwh2scrp5epdybhixext81jxcak17i पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८७ 104 66649 232812 162091 2026-07-01T11:34:32Z कल्पनाशक्ती 3813 232812 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|८२|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>बदलतें असा सिद्धांत काढण्यास काय प्रत्यवाय आहे? यावरून तुम्ही, मी व जगांतील प्रत्येक वस्तु ही सारी पूर्ण ब्रह्मरूप आहेत हा वेदान्तशास्त्राचा सिद्धांत आहे हे आपल्या लक्ष्यांत आले असेलच. आपण सारे ब्रह्माचे भाग अथवा लहान लहान तुकडे नसून संपूर्ण ब्रह्म आहों असें वेदान्तशास्त्राचे म्हणणे आहे. जगांतील प्रत्येक वस्तु केवलरूप, स्वयमेव आणि पूर्ण आहे; कारण ब्रह्माच्या ठिकाणी भाग संभवत नाहीत. आपणास जे भाग ह्मणून दिसतात, तो निवळ देखावा आहे. हे भाग मूळ वस्तूंत निर्माण झाले नसतांही तसा देखावा मात्र दिसत असतो. मी पूर्ण ब्रह्म असून सदामुक्त आहे. बद्ध असा मी कधीच नव्हतो. मी बद्ध आहे असा आपला समज तुह्मीं करून घेतला की मग मात्र तुमच्या पायांत श्रृंखला पडतात; पण मी मुक्त आहे असा अनुभव तुह्मास एकवार आला, की तुम्ही पुन्हां केव्हाही बद्ध होत नाही असें छाती ठोकून वेदान्त तुझांस सांगत आहे. वेदान्तशास्त्राच्या साऱ्या अट्टहासाचा हेतु हाच की तुह्मी मुक्त आहां, हे तुमच्या ध्यानी आणून द्यावें. तुम्ही पूर्वी केव्हांच बद्ध नव्हता, सांप्रत नाही आणि भविष्यत् कालीही तुम्ही बद्ध होणार नाही, अशी तुमची पक्की खात्री पटवून द्यावी, या एकाच हेतूनें वेदान्तशास्त्राने एवढें अफाट साहित्य निर्माण केले आहे. आपणांत केव्हाही बदल होत नाही; आपण केव्हाही मरत नाही आणि आपण केव्हां जन्मही घेत नाही. आतां या वेदान्त मतावर कोणी अशी शंका काढील की मग जन्म, बाल्य, तारुण्य, वार्धक्य आणि मृत्यु या वस्तूंचे स्वरूप तरी काय? या साऱ्या स्थिती प्रत्यही आह्मांस दिसतात. जगाचे अस्तित्वही हरघडी आमच्या प्रत्ययास येत असते. मग या साऱ्या देखाव्याचे होणार तरी काय? यावर वेदान्तशास्त्राचे उत्तर असें आहे की जगाला बाह्यतः जें अस्तित्व आहे तें काल, दिशा आणि कारण यांच्या उपाधीनें उत्पन्न झालेले आहे. प्रकृतीच्या उत्क्रांतीमुळे केवलरूप अनेक प्रकारें स्पष्टत्वास आल्यासारखे दिसते; तथापि हा निवळ भ्रममूलक देखावा आहे. वास्तविक केवलरूपाचे भाग पडत नाहीत आणि ते अनेक रूपें धारणही करीत नाही. याला संस्कृतांत विवर्तवाद असें नांव आहे. केवल रूपांत कांहीं बदल होत नाहीं अथवा त्यांत कसली उत्क्रांतिही होत नाही. अत्यंत क्षुद्र जंतूंत तें ब्रह्म पूर्णरूपानेच आहे. उपाधीमुळे तें अपूर्ण रूप दिसते इतकेंच.<noinclude></noinclude> nm5jevbjgi12dryedwig92w8d08reka पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८८ 104 66650 232813 162092 2026-07-01T11:37:52Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{RunningHeader|खंड ]|वेदान्त व हक्क.|८३}} {{rule}}</noinclude>त्याच्या भोवती जे जंतुदेहाचे जाळे आहे ते त्या पूर्ण रूपाला जंतु या संज्ञेस पात्र करते. या अत्यंत सूक्ष्म रूपापासून तो थेट अत्युच्च अशा मानवी रूपापर्यंत आकारांच्या ज्या अनेक घडामोडी होतात, त्या मूलरूपांत होत नसून त्या केवळ बाह्य आकारात मात्र होत असतात. मूळ जसे आहे तसेंच असते; परंतु त्यावरची आवरणे मात्र बदलत असतात.
{{gap}}अशी कल्पना करा की, आपणा समोर एक पडदा सोडलेला असून त्याच्या बाहेरच्या बाजूस एक सुंदर देखावा आहे. या पडद्याला एक लहानसें छिद्र असून त्या छिद्राच्या द्वारें बाह्य देखावा आपणांस अंशतः मात्र दिसत आहे. आता हे छिद्र हळुहळु मोठे होत जात आहे अशी कल्पना करा. तें जो जो अधिक मोठे होईल तो तो त्या देखाव्याचा अधिकाधिक मोठा भाग आपल्या दृष्टिपथांत येत जाईल हे उघड आहे. अशा रीतीने तो पडदा अखेरीस सर्वच नाहीसा झाला तर तो सारा बाह्य देखावा एकसमयावच्छेदें आपणांस दिसेल. या दृष्टांतांत सांगितलेला बाह्य देखावा म्हणजे आत्मरूप, आणि आम्ही व हे रूप या दोहोंच्यामध्ये काल, देश आणि कारण या उपाधीचा म्हणजे मायेचा पडदा आहे. या उपाधिरूप पडद्याला कोठे तरी एखादें छिद्र असते आणि त्याच्या द्वारे आत्मरूपाचा एखादा किरण मला दिसत असतो. हे छिद्र अधिक मोठे झाले म्हणजे या आत्मरूपाचा अधिकाधिक मोठा भाग मला दिसू लागतो; आणि अखेरीस हा मायेचा पडदा समूळ नष्ट झाला म्हणजे तें आत्मरूप मीच आहे अशी माझी खात्री होते. या विश्वांत अनेक प्रकारच्या घडामोडी प्रत्यहीं-प्रतिक्षणी-चालू आहेत. पण या घडामोडींचा संबंध आत्मरूपाशी-केवल रूपाशी-मात्र नाही. कोणत्याही प्रकारच्या घडामोडीचा उपसर्ग त्याला लागू शकतच नाही. या घडामोडी बाह्य सृष्टीतल्या आहेत. प्रकृतीची उत्क्रांति प्रत्येक क्षणी होत असते आणि अखेरीस तें केवलरूप स्पष्टत्वास आल्यासारखे दिसू लागते. या केवलरूपाचे अस्तित्व प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. कोणाच्या ठिकाणी या अस्तित्वाचा प्रत्यय कमी प्रमाणाने दिसत असतो तर दुसऱ्या एखाद्याच्या ठिकाणी तो अधिक प्रमाणावर असतो; आणि अशा प्रकारच्या कमीअधिकपणामुळे व्यक्तीव्यक्तीत लहानथोरपणा दिसू लागतो. वास्तविक पाहतां लहान आणि थोर असा भेद विश्वांत नसून ते एकरूपच आहे. केवळ आत्मरूपाच्या दृष्टीने<noinclude></noinclude> ou650hxju55d8ronp7z4gg9g583dp2i पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/८९ 104 66651 232814 162093 2026-07-01T11:41:15Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232814 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|८४|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम्}} {{rule}}</noinclude>पाहतां अमक्याचा आत्मा अधिक दर्जाचा आणि दुसऱ्या एखाद्याचा आत्मा क्षुद्र, असे म्हणणे म्हणजे अर्थशून्य बडबड करणेच होय. केवळ आत्म दृष्टीने पाहतां पशहून अथवा वृक्षादिकांहून मनुष्य प्राणी अधिक श्रेष्ठ आहे, हे म्हणणे अशास्त्र, अयथार्थ, आणि अर्थहीन आहे. वस्तुतः सर्व विश्व एकरूपच आहे. आत्मस्वरूपाच्या स्पष्टीभवनाच्या मार्गात झाड ही एक मोठी धोंड आड पडली आहे. चतुष्पाद जनावर ही अडचण त्याहून कमी आहे आणि मनुष्यप्राणी ही अडचण या दोहोंपेक्षाही कमी आहे. सुसंस्कृत आणि सुविद्य मनुष्यांत तर ही अडचण फारच थोडी असते आणि पूर्णत्व पावलेल्या मनुष्यांत ही अडचण मुळीच नसते. आपल्या इंद्रियांच्या द्वारें जी जी कर्मे आपण करीत असतो, त्या साऱ्यांच्या पोटी एकच हेतु असतो. तो हेतु हाच की आत्मरूपावरील हा पडदा दूर व्हावा. ज्या लहानशा छिद्राच्या द्वारें आत्मरूपाचा अंशतः प्रत्यय आपणांस येतो तें छिद्र मोठे करण्याकरितांच ही सारी धडपड आहे. बाह्य आकार आणि त्या मागील सत्यवस्तू यांजमध्ये असलेल्या पडद्याचे पदर एकामागून एक नाहीसे व्हावे या हेतूनेच आपण आपली सारी कसे करीत असतो; आणि अशा रीतीने कर्मे करीत असतां कांहीं वेळां परमावधीचे दुःख आपणास भोगावे लागते, तर कित्येक वेळां सुखसागरांत आपण पोहत असतो. आज हंसावें आणि उद्या रडावें, परवां विचारमन स्थितीत मूकवृत्ति धारण करून बसावें, तर तेरवां एकसारखी बडबडच करीत सुटावें हा आपला चालू आयुष्यक्रम आहे. या साऱ्या कृतींचें अंतिम पर्यवसान हा पडदा फाटण्याकडे व्हावें इतकाच आपला वास्तविक हेतु आहे. आत्म्याला मुक्त करावें हा आपल्या कर्माचा हेतु नाही; कारण तो मुक्तच आहे. आपल्या कर्माचा हेतु त्यावरील पडदा दूर करणे हा आहे. तो पडदा दूर झाला म्हणजे आत्मा स्वयमेव मुक्त आहे असा अनुभव होतो. ज्या जाळ्यांत तो सांपडला आहे तें तोडण्याचा आपला हेतु आहे. सूर्याच्या समोर आलेले ढग नाहीसे करावे हे वायूचे काम आहे. सूर्याला प्रकाशमय करण्याचे काम त्याचे नाही. कारण सूर्य स्वयंप्रकाश आहे त्याजवर आलेला ढगांचा पडदा वाऱ्याने उडवून दिला की प्रकाश आपोआपच फांकतो. सूर्यावरील ढगांचा पडदा जो जो अधिक पातळ होत जातो, तो तो त्याच्या प्रकाशाचा प्रत्यय अधिकाधिक स्पष्ट होत जातो.<noinclude></noinclude> ez5nssr7sc17g0sizmdd3ioq4ptszpb पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९७ 104 66659 232815 162256 2026-07-01T11:44:29Z कल्पनाशक्ती 3813 232815 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|९२|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>यांनी हे सारे घडवून आणले होते हे आपल्या लक्ष्यांत आले असेलच. "जातिभेद मोडणारा, विशिष्ट हक्कांचा विध्वंसक, सर्वत्र समता या तत्त्वाचा उपदेशक" अशा अथीची विशेषणे बुद्ध देवाला लावली असल्याचे माझ्या वाचण्यांत आले आहे. मूलतः सर्व मनुष्ये सारख्याच योग्यतेची आहेत असा उपदेश बुद्धांनी केला आहे. भगवान् बुद्धदेवानंतर जे त्याचे श्रमण अनुयायी होऊन गेले त्यांना हे तत्त्व चांगलेसें समजले होते असे दिसत नाही. नवा पंथ निर्माण करून त्यांत कमी अधिक दर्जाचे धर्मगुरु असावे अशा प्रकारचा यत्न त्यांनी केला होता. कोणताही पंथ म्हटला तरी त्याची भरभराट बहुतांशी त्यांतील घटकांच्या भोळेपणावर अवलंबून असते. पंथांतील अनुयायी अज्ञ आणि भोळे असले म्हणजे आपल्या पंथाच्या धर्मगुरूंच्या मागे मेंढरासारखे जावयाचे. हा भोळेपणा कायम राखावयाचा असेल तर तेथे सर्वत्र समता हे तत्त्व उपयोगी पडावयाचे नाही. सर्वच जर सारखे तर पायां पडणारा कोणी नाही आणि पडून घेणाराही कोणी नाही. केवळ लौकिक दृष्टया अशा पंथाची बोलबाला फारशी व्हावयाची नाही हे उघड आहे. हिंदुस्थानांतील धर्मविचाराच्या पायांत श्रृंखला केव्हांच पडली नाही. अगदी रानटी धर्मापासून 'सर्वं खल्विदं ब्रह्म' येथपर्यंत ही वाढ एकसारखी अविरतपणे होत गेली. धर्मयुद्ध अथवा धर्मासाठी छळ असा प्रकार तेथे केव्हांच घडला नाही. या बाबतींत समाजांतील प्रत्येक व्यक्तीला तेथें पूर्ण स्वातंत्र्य होतें. धर्मवेडामुळे रक्तपात झाला असें एकही उदाहरण हिंदुस्थानच्या धर्माच्या इतिहासांत आढळावयाचे नाही आणि याचें सारें श्रेय मुख्यतः अद्वैत मतालाच दिले पाहिजे. देशांतील साऱ्या वस्तीला स्वेच्छेनुसार कोणत्याही धर्मास अनुसरण्याची पूर्ण मुभा असावी आणि धार्मिक बाबतींत कोणाचाही छळ होऊ नये अशी स्थिति हिंदुस्थानांत प्राचीन काळापासून आहे ही गोष्ट त्या देशाला फार भूषणावह आहे असे म्हटले पाहिजे. नीति हे वेदान्ताचें एक व्यावहारिक रूप आहे. कोणत्याही काळी झाले तरी समाजाला नीति ही पाहिजेच. तिची आवश्यकता प्राचीन काळी होती आणि आता ती नाहीं असें नाही. किंबहुना आज मितीला तर या नीतिबंधनांची आवश्यकता अधिकच प्रखर भासू लागली आहे. हल्लीच्या काळी वाढत्या ज्ञानाबरोबर हक्क बजावण्याचे खूळ किती तरी पटीने वाढले आहे.<noinclude></noinclude> 1ud9rqjd3bdicn6lpl4kxhglxiip6ol पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/९८ 104 66660 232816 162258 2026-07-01T11:48:09Z कल्पनाशक्ती 3813 232816 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|वेदांत व हक्क.|९३}} {{rule}}</noinclude>ईश्वर आणि सैतान अथवा अहुरमझ्द आणि अहरिमन या पुष्कळ अंशाने कविकल्पना आहेत. ईश्वर आणि सैतान यांच्यातील वास्तविक फरक म्हटला म्हणजे एक परार्थ आणि दुसरा स्वार्थ इतकाच होय. सैतानालाही परमेश्वराप्रमाणेच ज्ञान आहे आणि त्याच्या इतकें सामर्थ्यही सैतानाला आहे. फरक इतकाच की परमेश्वराचे पावित्र्य त्याच्या ठिकाणी नाही, आणि एवढयामुळेच तो सैतान झाला. आता हेच माप सांप्रतच्या जगाला लावून पहा,ज्ञान आणि सामर्थ्य यांची अतिरिक्त वाढ आणि त्याबरोबरच पवित्रतेचा अभाव अशी साधनें मनुष्याच्या ठिकाणी एकत्र झाली म्हणजे त्याचा सैतान बनण्यास काय उशीर? यांत्रिक कल्पनेची विलक्षण वाढ सांप्रत काळी झाली आहे. यामुळे मनुष्याच्या सामर्थ्यांतही कल्पनातीत वाढ झाली आहे, पण या वाढीबरोबर पवित्रतेची कांही वाढ झाली आहे काय? ती झाली नसल्यामुळे सध्यां मनुष्यप्राणी अरेराव बनून नाना प्रकारचे हक्क गाजवू लागला आहे. प्राचीन काळी स्वतःच्या सामर्थ्याचा हक्क मनुष्याने इतक्या क्रूरतेने कधीही गाजविला नसेल. यामुळेच हे हक्कांचे खूळ मोडण्याची आवश्यकता वेदान्ताला आज जितकी वाटत आहे, तितकी ती पूर्वी कधीही वाटली नाही. मनुष्यांच्या देहाचेच नव्हे तर, जणूं काय, आत्म्याचेही मरण ओढवलें आहे असे सध्या वाढू लागते.
{{gap}}तुम्हांपैकी गीतेचा अभ्यास ज्यांनी केला असेल त्यांना ही वचनें या प्रसंगी अवश्य आठवतील:-
{{Block center|<poem>'''विद्याविनयसंपन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।''' '''शुनि चैव श्वपाके च पंडिताः समदर्शिनः ॥''' '''इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः ।''' '''निर्दोष हि समं ब्रह्म तस्माद्ब्रह्मणि ते स्थितः ॥''' {{right|(भ. गी. ५.)}}</poem>}} {{gap}}वेदान्तमताने प्रतिपादिलेल्या साऱ्या नीतिशास्त्राचे सार या दोनच श्लोकांत सांठविलें आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सर्वत्र साम्यावस्था पाहावयाची यांतच साऱ्या नीतीचा अंतर्भाव होतो. कर्त्याच्या क्रियेस अनुसरून जड जगांतील घडामोडी होत असतात हे आपणांस ठाऊक आहेच. कर्ता हाच शास्ता असून जड जग हे शासित आहे. कर्त्यात बदल झाला की जड<noinclude></noinclude> 974yjt2u4cqofudrex3f1x6svipid80 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०१ 104 66663 232817 162261 2026-07-01T11:51:25Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232817 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|९६|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>वता येते की नाही याचे परीक्षण सूक्ष्म दृष्टीने करीत जा. साऱ्या विश्वाच्या शक्ती एकवटून आपणावर तुटून पडल्या तरी यत्किचित्ही कंप पावणार नाही अशी आपल्या चित्ताची तयारी ज्या दिवशी होईल, त्या दिवशी आपण साम्यावस्थेला पोहोंचलों असें होईल. '''"आतां वसुधा तळही बुडो । वरी हे गगन कोसळुनी पडो ॥"''' आपल्या चित्तास भंग म्हणून नाही असे जेव्हां होईल तेव्हांच आपणास मुक्तिसुखाचा लाभ होईल. अशा प्रकारची साम्यावस्था म्हणजेच मुक्ति. मुक्ति म्हणून कांही निराळा पदार्थ आहे असें नाहीं. मुक्ति या जगांत-येथेंच-आहे. ती बाहेरून कोठून आणावयाची आहे असे नाही. याच मूळ कल्पनेपासून बाकीच्या साऱ्या विचारपरंपरांचा उदय जगांत झाला आहे. हा मूल सिद्धांत म्हणजे एक झराच असून त्यापासून अनेक सुंदर सरितांचा उगम झाला आहे, आणि त्यामुळे जग पावन झालें आहे. या अनेक सरिता परस्परांशी विरोधी असाव्या असाही भास केव्हां केव्हां होतो; तथापि तो विरोध नसून विरोधाभास मात्र असतो. त्याचप्रमाणे या मूल सिद्धांताबद्दल व त्यापासून निघणाऱ्या उपसिद्धांतांबद्दल पुष्कळ वेळां गैरसमज झाल्याचेही पाहण्यांत येते. पुष्कळांना या सिद्धांताचा अर्थच समजत नाही; तथापि हा सिद्धांत खरा आहे असे त्यांचे अंतर्याम त्यांना सांगत असते. केवळ ध्यानमग्न व्हावें या हेतूने बाह्यजगाशी असलेला सारा संबंध तोडून टाकून पर्वतगुहांचा अथवा अरण्यांचा आश्रय करणारे धीर पुरुष प्रत्येक राष्ट्रांत आढळतात. अशा रीतीने एकांतवास पतकरून ते ध्यान कशाचे करतात? याच एका सिद्धांताचें. उलटपक्षी अत्यंत उत्साही, तेजस्वी आणि खटपटी माणसें आपण होऊन सामान्य जनतेत संचार करीत असतात आणि गरीबदुबळे व आजारी आणि दुःखीकष्टी माणसांच्या यातना कमी करून त्यांस धीर देण्यासाठी धडपडत असतात. असे करण्यांत या माणसांचा मूलहेतु काय असतो? या मूलसिद्धांताचा शोध लावावा हाच. हे दोन मार्ग परस्परांपासून अगदी भिन्न आहेत. किंबहुना ते परस्परांस विरोधी असावे असाही निश्चय सकृद्दर्शनी होत असतो. सर्वसंगपरित्याग करून अरण्याचा अथवा गुहेचा आश्रय करणारा मनुष्य या दुसऱ्या प्रकारच्या लोकांस तुच्छ समजत असतो. दुसऱ्यांची दुःखें हलकी करण्यासाठी त्यांच्यांत मिसळून जाणारी परोपकारी माणसें संसारपंकांत बुडालेली आहेत<noinclude></noinclude> fposo8knhizv69ss4j9nz2x4j6p77qn पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०३ 104 66665 232818 162263 2026-07-01T11:54:19Z कल्पनाशक्ती 3813 /* Proofread */ 232818 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|९८|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[नवम}} {{rule}}</noinclude>{{gap}}एका राजाच्या पदी शेकडों सरदार आणि दरकदार होते. महाराजांच्या ठिकाणी आपली अत्यंत भक्ति आहे असे प्रत्येकजण म्हणे. राजासाठी आपण प्राणही देण्यास तयार आहो असें प्रत्येकजण भासवीत असे. आपल्या इतका अनन्यसेवक महाराजांस दुसरा कोणीही मिळावयाचा नाही असे प्रत्येकजण राजाला सांगे. कालांतराने एके दिवशी एक संन्यासी राजदरबारी आला. त्याच्याशी कांहीं संभाषण चालू असतां राजा संन्याशाला म्हणाला, "जिवाला जीव देणारे इतके सरदार दुसऱ्या कोणाही राजाच्या पदरी नसतील." संन्यासी हसून म्हणाला, "राजा तुझ्या भाषणांत सत्य किती आहे हे कोणी सांगावें?" राजाने उत्तर दिले, "आपली मर्जी असेल तर आपण यांची प्रत्यक्ष परीक्षाच पहा." राजाचे म्हणणे कबूल करून त्या संन्याशाने एक मोठा यज्ञ आरंभिला. या यज्ञाची सांगता झाली म्हणजे राजाचे राज्य सर्व पृथ्वीवर पसरेल असें त्या यज्ञाचें फळ त्याने सांगितले, आणि सांगतेकरिता एक मोठा हौद बांधवून राजाच्या पदरच्या सर्व सरदारांनी त्यांत रात्रीच्या वेळी दुधाच्या घागरी ओताव्या असें फर्मान राजाकडून काढविले. राजा हसून म्हणाला, "महाराज, हीच का तुमची परीक्षा? यांत नापसंत कोणीच उरणार नाही." सर्व सरदारांनीही ताबडतोब माना डोलवून मोठा आनंद व्यक्त केला. रात्र पडून अगदी काळोख झाला तेव्हां साऱ्या सरदारांनी आपापल्या घागरी आणून त्या हौदांत ओतल्या. सकाळी पाहतात तो तो हौद नुसत्या पाण्याने मात्र भरला आहे असे आढळून आले. राजाच्या सर्व सरदारांपैकी प्रत्येकाने आपल्या मनाशी विचार केला की, इतक्या दुधांत माझी एक घागर पाण्याची असली तरी ती कशी ओळखू येणार? या विचाराने प्रत्येकाने पाण्याची घागर त्या हौदांत ओतली होती. आपणांपैकी प्रत्येकाची स्थिति आज याच प्रकारची आहे. तत्त्व चांगले असले तरी त्याचा आचार सुरू करण्याची जबाबदारी आपण लोकांवर टाकीत असतो. मी एकट्यानेच त्याच्याविरुद्ध वर्तणूक केल्याने समाजाचे नुकसान कितपतसें होणार, असा विचार प्रत्येकाच्या मनांत येतो. यामुळे आपल्या वाट्यांस जी कांही सामाजिक कामें येत असतात त्यांची वाट आपण या सरदारांप्रमाणेच लावीत असतो.
{{gap}}सर्व मनुष्ये एकाच ईश्वराची लेकरें असल्यामुळे परस्परांत बंधुत्वाचे नाते आहे ही गोष्ट अगदी उघड असल्यामुळे ती साऱ्याच्या प्रत्ययाचीच आहे<noinclude></noinclude> 5ir1h3344hnwiuuxbsp32ixsolw62i1