विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.9
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf
106
1874
232838
232820
2026-07-03T05:45:36Z
कल्पनाशक्ती
3813
232838
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=विवेकानंद
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न. म. कुलकर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

45fo6ad1qc3sipvodpyynlbb5rkgrmh
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१०९
104
66671
232833
162280
2026-07-03T05:21:28Z
कल्पनाशक्ती
3813
232833
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|१०४|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[नवम}}
{{rule}}</noinclude>रितां अशी एकतानता वंद्य नसून निंद्य आणि त्याज्य आहे. ही विचारपरंपरा सांगणारा पक्ष सर्व देशांत आणि सर्व काली अस्तित्वात होता आणि आजही तो सर्वत्र अस्तित्वात आहे. निरनिराळ्या देशांत अस्तित्वात असलेल्या या पक्षांत कोठे भेद असेल तर तो भाषेचा मात्र आहे. देशकालानुरूप हेच तत्त्व अनेक भाषांनी प्रकट होत असते. हा पक्ष या तत्त्वाचा उच्चार पुनःपुन्हां मोठ्या जोराने करीत असतो आणि असें करण्यांत जातीची उच्चनीचता समाजांत कायम राहीसे करावें हाच उद्देश त्याला साधावयाचा असतो. ज्या वेळी एखाद्या जातीचे वर्चस्व कायम राखावयाचे असेल त्या वेळी या तत्त्वाचा उच्चार हा पक्ष फार जोराने करीत असतो. आमच्या हिंदुस्थानांतील ब्राह्मण हीच उपपत्ति आपल्या सामाजिक हक्कांच्या रक्षणासाठी पुढे आणीत असतात. जातिभेद नष्ट झाला तर समाजही नष्ट होईल असे ते म्हणतात. हिंदुसमाजाइतका प्राचीन समाज आज कोठेही अस्तित्वात नाही, ही गोष्ट इतिहाससिद्ध आहे; आणि हिंदुसमाज इतक्या स्थित्यंतरांतून वांचला याचे कारण जातिभेद आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अशा रीतीने ऐतिहासिक पुराव्याचा उपयोग करावयास सांपडल्यामुळे त्यांच्या या मताला सकृद्दर्शनी तरी मोठे महत्त्व प्राप्त होते. दीर्घ आयुष्य जीमुळे प्राप्त होते अशी वस्तु व्यक्तीला अथवा समाजाला अत्यंत इष्ट अशीच गणली पाहिजे असें अधिकारयुक्त वाणीने ते सांगत असतात, आणि हे त्यांचे म्हणणे खोडून काढणे मुष्किलीचे आहे असें सकृदर्शनी तरी मनांत आल्यावांचून राहत नाही.
{{gap}}जगाचे अस्तित्व ऐक्यावर नसून भेदावर अवलंबून आहे असे म्हणणारा पक्ष ज्याप्रमाणे आरंभापासून अस्तित्वात आहे, त्याचप्रमाणे ' सर्वं खल्विदं ब्रह्म' असें म्हणणारा पक्षही त्याच काळापासून अस्तित्वात आहे. उपनिषद्ग्रंथ, बुद्ध, ख्रिस्त इत्यादिकांच्या कालापासून तो थेट चालू क्षणापर्यंत या पक्षाच्या अस्तित्वाचा प्रत्यय येतो. देशकालपरिस्थित्यनुरूप या पक्षाच्या भाषेत फरक पडत असला तरी मूलतत्व तेंच आहे हे लक्ष्यांत आणले पाहिजे. गरिबांचा कैवारी सोशालिस्ट पक्ष, ज्यांना समाजांत कसलाच हक्क नाही अशा खालच्या वर्गाचे पुढारीपण स्वीकारणारा पक्ष, वगैरे साऱ्या मतांचे प्रचारक हे तत्त्वतः या ऐक्यपक्षाचेच लोक होत. अमुक मनुष्य कमी का अथवा अमुका दुसरा अधिक का, असा प्रश्न हे लोक विचारतात तेव्हां या<noinclude></noinclude>
3ctrcsc8k2ysj8gfw12pmmewrmn25dp
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११०
104
66672
232834
162281
2026-07-03T05:26:16Z
कल्पनाशक्ती
3813
232834
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|हक्क.|१०५}}
{{rule}}</noinclude>प्रश्नाच्या पोटी सर्व साम्याच्या तत्त्वाचाच अंतर्भाव झालेला असतो; तथापि मनुष्यस्वभावच असा आहे की गोड ऊस मुळासकट खावा. कोणत्याही कारणाने त्याला विशिष्ट हक्कांची प्राप्ति झाली की त्यांच्या रक्षणासाठी त्याची धडपड एकसारखी सुरू असते. आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी सारे बुद्धिबल तो एकत्र करीत असतो. बुद्धिवादांत प्रतिपक्षाला नामोहरम करण्याकरितां अगदी एकदेशीय विचारही पुढे आणावयास तो कचरावयाचा नाही. या प्रश्नाला दोन बाजू आहेत ही गोष्ट विसरणे त्याला अधिक सोयीचें वाटते. यामुळे प्रतिपक्षाच्या विचारसरणीकडे ढुंकूनही न पाहतां आपलेंच
म्हणणे तो पुनःपुन्हां मोठ्या आवेशाने प्रतिपादित असतो. ही तऱ्हा दोन्ही पक्षांत सारखीच आढळून येते.
{{gap}}अतींद्रिय शास्त्राच्या दृष्टीने विचार करतां हाच प्रश्न आणखीही एका स्वरूपाने आपणासमोर उभा राहतो. विश्वांत आकारांची विविधता आहे. या विविधतेच्या पोटी कोठे एकतानता आहे की नाही हा प्रश्नच विचारार्ह नाहीं असें बौद्धांचे म्हणणे आहे. जग आहे असेंच घेऊन चालण्यांत आपलें नडतें कोठे असा उलट प्रश्न ते विचारतात; आणि ज्या अर्थी आपलें नडत नाहीं त्या अर्थी ते आहे तसेंच ठीक म्हणून चालणे त्यांना इष्ट वाटते. ते ह्मणत्तात विविधता हेच जीविताचें सारसर्वस्व आहे. बाह्यतः ती कितीही दुःखप्रद आणि दुबळी वाटत असली तरी जीविताचें सारे स्वारस्य तींतच आहे. याकरितां ती टाकू पाहणे म्हणजे जीवित निःसार करणे होय." यावर वेदान्त उत्तर देतो, "मूलस्थानापासून भ्रष्ट झालेल्या आणि त्यामुळे विविधता पावलेल्या या रूपाकडे पाहूं नका. जेथून ही विविधता उत्पन्न होते त्या मूल एकरूपाकडे पहा." यावर बौद्ध म्हणतात, "एकरूपता ही काल्पनिक वस्तु आहे. प्रत्यक्ष अनुभवाच्या विविधतेला सोडून काल्पनिक ऐक्याच्या मागे का लागता?" प्राचीन काळी असलेला हा मतविरोध आपल्या आजच्या काळापर्यंत असाच चालत आला आहे. प्राचीन काळापेक्षा सध्याच्या काळी आपल्या ज्ञानांत कितीतरी मोठी भर पडली असतां धर्मविचारांत आणि अतींद्रिय शास्त्राच्या सिद्धांतांत एवढा विरोध का असावा असा प्रश्न कदाचित् उभा राहील; पण त्याला उत्तर हेच की प्राचीन काळापेक्षा सध्याच्या काळी ज्ञानाच्या समवायी रूपांत फारशी भर पडलेली नाही. पूर्वीच्या लोकांहून<noinclude></noinclude>
3abdg1uoj7s37uxoraexyk0uaag041z
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१११
104
66673
232835
162282
2026-07-03T05:30:13Z
कल्पनाशक्ती
3813
232835
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|१०६|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[नवम}}
{{rule}}</noinclude>आपण अधिक ज्ञानी असे आपणास वाटते, पण हा आपला भ्रम आहे. अतींद्रियशास्त्र पांच हजार वर्षांपूर्वीच अगदी कळसास पोहोचून गेले होते. त्याचप्रमाणे अति प्राचीन काळीच धर्मविचारही पूर्णता पावले होते. याबाबीत आपली सांप्रतची करामत म्हटली तर निराळ्या भाषेत तेच सिद्धांत पुन्हा उगाळणे इतकीच आहे. फार झाले तर त्या सिद्धांतांची सत्यता सिद्ध करण्यास काही नवी उदाहरणे आपण पुढे करतो. यामुळे या परस्परविरोधी मतांचे युद्ध आजतागाईत असेंच चालू आहे. एक पक्ष आम्हाला विविधतेशी जखडून ठेवण्याचा यत्न करीत आहे आणि दुसरा त्याविरुद्ध मांडत आहे.
सकृद्दर्शनी अनुलंघ्य अशी प्रमाणे उभी करून पहिला पक्ष विविधता चिरस्थायी आहे व ती तशीच राहणार असें अट्टाहासाने सांगत आहे. ज्याला आपण जीवित असें म्हणतों तो विविधतेचा परिणाम आहे असे तो म्हणत आहे. उलटपक्षी दुसरी बाजू ऐक्याकडे आपणास तितक्याच अट्टाहासाने ओढूं पाहत आहे.
{{gap}}नीतिशास्त्राच्या दृष्टीने या प्रश्नाचा विचार करतां या विरोधी मतांच्या लढाईत हे शास्त्र पडलेले नाही असे आढळून येते. या रणांगणाच्या आसपासही राहूं नये अशा विचाराने ते तेथून पुष्कळच लांबवर गेले आहे. या लढाईचा संपर्कही स्वतःस लागू न देतां आपला मार्ग अगदी स्वतंत्रपणे काढणारे असे एखादें शास्त्र असेल तर तें नीतिशास्त्रच होय. अशा प्रकारची एखादी लढाई चालू आहे हा विचारसुद्धा न करतां ऐक्याच्या दिशेने आपला मार्ग तें आक्रमीत आहे. नीतिशास्त्राचा मूळ पायाच ऐक्य हा आहे. प्रेम हे नीतिशास्त्राचे जीवन. विविधतेकडे नीतिशास्त्र ढुंकूनही पाहावयाचें नाही. सर्वत्र ऐक्य उत्पन्न करावयाचें, या एकाच इराद्याने आपले कार्य तें करीत आहे. मानवजातीने शोधून काढलेले नीतिशास्त्राचे अत्युच्च नियम चाळून पाहतां, त्यांत विविधतेला थाराही मिळावयाचा नाही असे आपणास आढळून येईल. विविधता ही कोणत्या जातीची उपपत्ति आहे याची चौकशी करण्यापुरताही वेळ, जणू काय, त्याला नाही. त्याचा उद्देश एकच. सर्वत्र ऐक्य घडवून आणावें एवढीच गोष्ट तें जाणते. आमच्या हिंदुशास्त्रकारांची मनःप्रवृत्ति स्वभावतःच पृथकरणप्रिय आहे. विचाराकरितां एखादा पदार्थ
त्यांनी हाती घेतला की त्याचे सगळे घटक वेगळे करून त्यांचा पुरा शोध<noinclude></noinclude>
1sxlyojmnxje6g09sn03v1thkd0hwja
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११६
104
66681
232836
162288
2026-07-03T05:39:40Z
कल्पनाशक्ती
3813
232836
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|हक्क.|१११}}
{{rule}}</noinclude>{{nop}}साम्य उत्पन्न होण्याकरितां आपण केलेल्या अनेक खटपटींचे अत्युच्च फळ म्हटलें म्हणजे विशेष हक्क नाहीसे करणे हे होय; आणि इतके मात्र आपणास करता येण्यासारखे आहे. आपणापुढे जे काही कार्य आज आहे तें हेच. हे सिद्ध होण्याकरिता एखाद्या व्यक्तीने अथवा एखाद्या राष्ट्रानेच नव्हे, तर साऱ्या जगानें खटपट केली पाहिजे. जगांतील साऱ्या समाजांत हे युद्ध चालू आहे. या लढाईपासून मुक्त असा एकही समाज अथवा एकही मानववंश पूर्वी अस्तित्वात नव्हता आणि सांप्रतही नाही. समाजांतील एखादा व्यक्तिसमूह बाकीच्या व्यक्तींहून बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असेल; पण एवढ्याकरितां बाकीच्या समाजांतील साऱ्या घटकांचे शारीरस्वास्थ्यसुद्धा त्याने हिरावून घ्यावें हा कोठला न्याय? एक दुसऱ्याहून अधिक बुद्धिमान् आहे हेच या अनर्थाचें मूळ नव्हे; तर आपल्या बुद्धीच्या जोरावर दुसऱ्यांच्या शारीरसुखाच्याही आड तो येऊ लागतो हीच मोठी अडचणीची गोष्ट आहे. ज्याला बुद्धि नाही त्याला बौद्धिक आनंदाची प्राप्ति अर्थातच नाहीं; आणि शारीरिक आनंद त्याला मिळावा हे योग्य असतां त्यालाही तो मुकतो. केवळ उच्चेतर बुद्धीमुळे उत्पन्न होणाऱ्या हक्कांचा नाश करण्यासाठी या उभयपक्षांत रणे माजू लागतात. त्याच प्रमाणे जे कित्येक शरिराने वरिष्ठ असतात ते दुबळ्यांच्या सुखाच्या आड येतात; आणि असे का ह्मणून विचारले तर 'बळी तो कान पिळी' हा न्यायच आहे असें ह्मणूं लागतात. मग या दोन पक्षांत युद्धास सुरवात होते. केवळ शारीरिक बळ अधिक म्हणून दुसऱ्याच्या सुखाच्या आड येणे ही गोष्ट नीतिनिर्बधांस सोडून आहे, आणि यामुळेच दोन पक्षांत युद्धास सुरवात होते. दुसरे कित्येक लोक जन्मतःच द्रव्यदृष्टि असतात. पैशाचे दोन पैसे कसे करावे ही अक्कल इतरांहून त्यांस अधिक असते. एखाद्याच्या अंगी असा गुण असणे स्वाभाविक आहे; पण जवळ चार पैसे अधिक होण्याबरोबर इतर गोरगरिबांस खुशाल तुडविण्याचा हक्क त्यास प्राप्त होतो काय? हे कर्म नीतीला सोडून असल्यामुळेच श्रीमंत आणि गरीब यांच्यांतील तेढ सांप्रतविकोपास जाऊ पाहत आहे. आपल्या अंगांतील विशेष गुणांचा उपयोग दुसऱ्याला नाडण्याकडे करणे हेच विशिष्ट हक्काचे रूप होय; आणि मानव जातीचा इतिहास युगांतरापासून पाहिला तरी प्रत्येक समाजांत असले राक्षसी हक्क नष्ट करण्याकडेच जनसमूहाची प्रवृत्ति आहे असे दिसून येईल. नीति-<noinclude></noinclude>
8sbynfklihhto7la75to85p069eaaio
232840
232836
2026-07-03T05:48:28Z
कल्पनाशक्ती
3813
232840
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|हक्क.|१११}}
{{rule}}</noinclude>{{gap}}साम्य उत्पन्न होण्याकरितां आपण केलेल्या अनेक खटपटींचे अत्युच्च फळ म्हटलें म्हणजे विशेष हक्क नाहीसे करणे हे होय; आणि इतके मात्र आपणास करता येण्यासारखे आहे. आपणापुढे जे काही कार्य आज आहे तें हेच. हे सिद्ध होण्याकरिता एखाद्या व्यक्तीने अथवा एखाद्या राष्ट्रानेच नव्हे, तर साऱ्या जगानें खटपट केली पाहिजे. जगांतील साऱ्या समाजांत हे युद्ध चालू आहे. या लढाईपासून मुक्त असा एकही समाज अथवा एकही मानववंश पूर्वी अस्तित्वात नव्हता आणि सांप्रतही नाही. समाजांतील एखादा व्यक्तिसमूह बाकीच्या व्यक्तींहून बुद्धिमत्तेने श्रेष्ठ असेल; पण एवढ्याकरितां बाकीच्या समाजांतील साऱ्या घटकांचे शारीरस्वास्थ्यसुद्धा त्याने हिरावून घ्यावें हा कोठला न्याय? एक दुसऱ्याहून अधिक बुद्धिमान् आहे हेच या अनर्थाचें मूळ नव्हे; तर आपल्या बुद्धीच्या जोरावर दुसऱ्यांच्या शारीरसुखाच्याही आड तो येऊ लागतो हीच मोठी अडचणीची गोष्ट आहे. ज्याला बुद्धि नाही त्याला बौद्धिक आनंदाची प्राप्ति अर्थातच नाहीं; आणि शारीरिक आनंद त्याला मिळावा हे योग्य असतां त्यालाही तो मुकतो. केवळ उच्चेतर बुद्धीमुळे उत्पन्न होणाऱ्या हक्कांचा नाश करण्यासाठी या उभयपक्षांत रणे माजू लागतात. त्याच प्रमाणे जे कित्येक शरिराने वरिष्ठ असतात ते दुबळ्यांच्या सुखाच्या आड येतात; आणि असे का ह्मणून विचारले तर 'बळी तो कान पिळी' हा न्यायच आहे असें ह्मणूं लागतात. मग या दोन पक्षांत युद्धास सुरवात होते. केवळ शारीरिक बळ अधिक म्हणून दुसऱ्याच्या सुखाच्या आड येणे ही गोष्ट नीतिनिर्बधांस सोडून आहे, आणि यामुळेच दोन पक्षांत युद्धास सुरवात होते. दुसरे कित्येक लोक जन्मतःच द्रव्यदृष्टि असतात. पैशाचे दोन पैसे कसे करावे ही अक्कल इतरांहून त्यांस अधिक असते. एखाद्याच्या अंगी असा गुण असणे स्वाभाविक आहे; पण जवळ चार पैसे अधिक होण्याबरोबर इतर गोरगरिबांस खुशाल तुडविण्याचा हक्क त्यास प्राप्त होतो काय? हे कर्म नीतीला सोडून असल्यामुळेच श्रीमंत आणि गरीब यांच्यांतील तेढ सांप्रतविकोपास जाऊ पाहत आहे. आपल्या अंगांतील विशेष गुणांचा उपयोग दुसऱ्याला नाडण्याकडे करणे हेच विशिष्ट हक्काचे रूप होय; आणि मानव जातीचा इतिहास युगांतरापासून पाहिला तरी प्रत्येक समाजांत असले राक्षसी हक्क नष्ट करण्याकडेच जनसमूहाची प्रवृत्ति आहे असे दिसून येईल. नीति-<noinclude></noinclude>
8s2kin5ylb9fba7voo1btd3zmrt4o89
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११७
104
66682
232837
162289
2026-07-03T05:43:25Z
कल्पनाशक्ती
3813
232837
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|११२|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>शास्त्राचा रोखही याच दिशेने आहे. याच मार्गाने आपणही कार्य करू लागलों तर विविधतेचा लय न होतांही ऐक्यप्रवृत्ति वाढेल.
{{gap}}सांप्रत दिसणारी सारी विविधता अशीच राहू द्या. त्याला आमची ना नाही; कारण विविधता हे जीविताचे रहस्य आहे. जीवित तीवरच अवलंबून आहे. तुम्ही कदाचित् श्रीमान् व्हाल आणि मी भिकारी राहीन. तुम्ही धष्टपुष्ट असाल आणि मी सुदामदेव असेन. तुम्ही मोठे पंडित असाल आणि मी अक्षरशत्रु असेन. तुम्ही धर्मवेत्ते असाल आणि मी धर्महीन असेन; पण असें असले तरी काय झाले? आपण एकमेकांच्या आड न येतां आपापल्या विशिष्ट जागी सुखाने राहूं या. तुमच्यापाशी एखादा गुण माझ्याहून अधिक असला म्हणून तेवढयाने तुम्ही माझ्याहून थोर होतां काय? तुमच्या आणि माझ्या बाह्य स्थितीत जमीन अस्मानाचे अंतर दिसत असले तरी वस्तुतः तुमची व माझी विश्वांतील जागा एकच आहे. तेथे लहानमोठा हा भेद नाही.
{{gap}}यापुढे नीतिशास्त्राला जें कार्य करावयाचे आहे तें विविधतेचा नाश हे नसून विविधतेच्या पोटी ऐक्य आहे हे ओळखण्याचे आहे. सर्वत्र साम्यावस्था उत्पन्न करावयाची हे काम नीतिशास्त्राचे नव्हे. कारण एक तर हे अशक्य कोटींतले आहे; आणि दुसरे असे की ज्या दिवशी तें सिद्धीस जाईल त्या दिवशी जगाचाही अंत होईल, आणि असे होणे इष्ट नाही. या विविधतेच्या मागे जे ऐक्य आहे तें परमात्मरूप आहे. ते ओळखणे हे त्या शास्त्राचे काम आहे. आज कोणी कितीही दुबळा असला तरी सामर्थ्यांच्या साऱ्या निधीचा तो हक्कदार वारस आहे हे ओळखणे हे नीतिशास्त्राचे काम आहे. बाह्यतः कोणी कितीही पापी दिसत असला तरी तो अनंत आणि पुण्यमयरूपाचा अधिकारी आहे हे जाणणे हे नीतिशास्त्राचे काम आहे. अशा रीतीने या प्रश्नाचा विचार दोन्ही बाजूंनी आपण केला पाहिजे. एकच पक्ष स्वीकारण्याने भावी युद्धाचे बीजारोपण आपण करीत असतो. वस्तुस्थिति आहे तशी साकल्याने पाहणे हेच युक्त आहे. तिची एखादी बाजू पाहून तो एकच पक्ष स्वीकारणे अनर्थास कारण होते. दोन्ही बाजूंचा सारासार विचार करून त्यांतील तत्त्वांशाचे ग्रहण करणे आणि ती तत्त्वे प्रत्यक्ष आचरणांत आणणे हेच आपले कर्तव्य आहे. अशा मार्गाने आपण चाललों तर व्यक्ति दृष्टया आपलें हित होईलच; पण समाजाचे एक घटक या नात्याने समाजहितही साधेल.{{nop}}<noinclude></noinclude>
71pf1njhpe2s8asrbjw36qx30x5pg3y
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/११८
104
66683
232839
162290
2026-07-03T05:47:36Z
कल्पनाशक्ती
3813
232839
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]|अभ्यास.|११३}}
{{rule}}</noinclude>

{{center|{{x-larger|'''८'''
'''अभ्यास.'''}}}}
{{gap}}प्राणायामाच्या आणि तशाच प्रकारच्या दुसऱ्या काही अभ्यासासंबंधी आज आपणास काही माहिती देण्याचा माझा विचार आहे. नुसत्या उपपत्तीसंबंधी आज इतका दीर्घ काळ अनेक प्रकारची माहिती मी सांगितली आहे की आतां प्रत्यक्ष अभ्यासासंबंधी काही माहिती सांगणे अवश्य झालें आहे. या विषयावर हिंदुस्थान देशांत फार मोठी ग्रंथसंपत्ति निर्माण झालेली आहे. ज्याप्रमाणे ऐहिक विषयांच्या बाबतींत तुम्ही पाश्चात्य लोक व्यवहारज्ञ आहां त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या बाबतीत आमचा देश मोठा व्यवहारकुशल आहे. संसाराच्या बाबतींत जसा चोख व्यवहार करण्याकडे तुमचे सारें ध्यान असते, त्याचप्रमाणे परमार्थाच्या बाबतींत आमची सारी अक्कल खर्च होत असते. तुमच्या देशांत पांचच माणसे एकत्र जमलीं तर ताबडतोब एखादी 'लिमिटेड कंपनी' काढण्याच्या गोष्टी त्यांच्यांत सुरू होतात, आणि अवघ्या पांच तासांच्या आंत तशी एखादी व्यापारी मंडळी प्रत्यक्ष अस्तित्वांतही येते. आमच्या हिंदुस्थानांत दहा पांच माणसांनी आपली डोकी पन्नास वर्षे घांसली तरी असले काम त्यांच्या हातून धडपणी निभावयाचे नाही. असल्या प्रकारच्या गोष्टींचा व्यवहारच त्यांना ठाऊक नाही; पण एखाद्याने एखादा नवा तत्त्वमार्ग काढला तर त्याला काही ना काहीं शिष्यमंडळी मिळावयाचीच. त्याच्या मार्गात खरोखर कांही तथ्य आहे की नाही हा विचारसुद्धा कोणाच्या मनांत यावयाचा नाही. त्याच्या उपपत्तीत अरण्यपांडित्य भरले असले तरीही शेंकडों शिष्य त्याच्यामागे धावतील. अहोरात्र बारा वर्षेपर्यंत एका पायावर उभे राहिल्यास मुक्ति खात्रीने मिळेल असे सांगणारा जरी कोणी उभा राहिला तरी तसल्या वेड्या पिराच्या मागे शेंकडों शिष्य लागतील आणि खरोखरच तसला अभ्याससुद्धा ते करू लागतील, हा अभ्यास चालू असतां शारीरिक क्लेश कितीही भोगावे लागले तरी त्यांजकडे ही मंडळी लक्ष्य देणार नाही. असले हाल मोठ्या आनंदाने ते सोसतील. कित्येक पंथांतील लोक वर्षानुवर्ष आपला हात उभाच्या उभा<noinclude>
{{gap}}स्वा० वि० ९-८</noinclude>
iwwkan5op1lvvpryecf0azngipuh4jm
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२०
104
66685
232841
162293
2026-07-03T05:52:40Z
कल्पनाशक्ती
3813
232841
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]| अभ्यास.|११५}}
{{rule}}</noinclude>तो आपल्या ठिकाणी अज्ञान किती भरले आहे, हे आपणास कळू लागतें. मनुष्याचें मन हा एक मोठा अजबखाना आहे. त्यांत अनंत विचारांचे भांडार सांठविलेले आहे. माझ्या लहानपणी असल्या हठयोग्यांच्या अभ्यासाच्या गोष्टी मी ऐके तेव्हां मला हसू येऊन असल्या लोकांवर मनमुराद टीका मी करीत असे. आमच्यांतील पुष्कळ साधुसंतांनी सुद्धा असल्या प्रकारावर पुष्कळ कडक टीका केली आहे. कालेंकरून माझें वय वाढत जात आहे तो तो अशी टीका करण्याचा अधिकार आपणास नाही हेच मला अधिकाधिक पटत आहे. ते ज्या क्रिया करतात आणि त्या करीत असतां ज्या भयंकर विपत्ती ते भोगीत असतात, त्याच्या शतांश विपत्ती भोगण्याचे सामर्थ्य माझ्या अंगी असते तर किती तरी बरे झाले असते, असेंही केव्हां केव्हां माझ्या मनांत आल्यावांचून राहत नाही. सूक्ष्म विचारांती या माझ्या भावनेचे खरे स्वरूप माझ्या लक्ष्यांत आले. स्वशरीराला पीडा करणाऱ्या या लोकांकडे पाहून मला राग येतो, त्यांना शिव्या देण्याची इच्छा मला होते; पण ही भावना पीडेची अनावड माझ्या चितांत आहे म्हणून उत्पन्न झाली असें मात्र नव्हे. माझ्या अंतःकरणाच्या कोमलपणाचा तो परिणाम नसून माझ्या भेकडवृत्तींतून ही असूया निपजली आहे. त्यांच्याप्रमाणे वागण्याची छाती मला नाहीं; तितकें धैर्य मजपाशी नाही. जे मला करवत नाहीं तें दुसऱ्यानी केलेलें मला पाहवत नाही.

{{gap}}धैर्य, सामर्थ्य, मनोबल या मोठ्या विचित्र वस्तू आहेत. एखाद्याबद्दल बोलतांना, अमुक मनुष्य मोठा धैर्यवान् आहे, शूर आहे, मोठ्या छातीचा आहे अशी भाषा आपण वापरीत असतो. पण त्याच्या दानतींतील ज्या एखाद्या भागाकडे पाहून हा निकाल आपण देत असतो. तेवढ्यावरून त्याच्या एकंदर दानतीची परीक्षा होते असें मात्र नव्हे. एखादा शिपाई प्रसंगी तोफेच्या तोंडावरही धांवून जाईल; पण शस्त्रवैद्याचा लहानसा चाकू पाहून भीतीने कदाचित् त्याची गाळण उडून जाईल. उलटपक्षी दुसऱ्या एखाद्याच्या अंगीं शत्रूच्या तोफेवर धावण्याचे धैर्य नसेल, पण जरूर पडल्यास शस्त्रवैद्याकडून एखादा मोठा अवयव तोडला जात असतांही सारे दुःख तो मुकाट्याने गिळून बसेल. याकरितां कोणाही मनुष्याचे परीक्षण करून त्याला भलाबुरा ठरवीत असतांना भलेबुरेपणाची आपली व्याख्या काय आहे<noinclude></noinclude>
16whoyrtq27408xowl2wltkhomb6wk2
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२१
104
66686
232842
162294
2026-07-03T05:55:25Z
कल्पनाशक्ती
3813
232842
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|११६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>याचाही विचार प्रथम अवश्य केला पाहिजे. एखादा मनुष्य चांगला नाही असें मी म्हणत असतो तेव्हां तो चांगुलपणाच्या माझ्या व्याख्येच्या कसोटीस उतरत नाही इतकाच अर्थ ध्यानात घेतला पाहिजे. ज्या गोष्टी मला करता येत नाहीत त्या त्याला किती तरी चांगल्या रीतीने करतां येत असतील; आणि या दृष्टीने तो मजहून किती तरी अधिक चांगला असेल.

{{gap}}आतां आणखीही एखादें उदाहरण घेऊ. स्त्री आणि पुरुष यांच्यांतील गुणावगुणांबद्दल कोठेही वाद निघाला तरी त्यांतील पूर्वोत्तरपक्ष एकच चूक नेहमी करीत असतात. पुरुष युद्ध करू शकतात आणि भयंकर शारीरिक श्रमांची कामेही ते करतात हे दाखवून, या गोष्टी स्त्रिया करूं शकत नाहीत म्हणून त्या कमी प्रतीच्या आहेत असें एक पक्ष प्रतिपादन करीत असतो. पण असे करणे सर्वथा अन्याय्य आहे. पुरुषापेक्षा स्त्रीच्या ठिकाणी धैर्य कमी असतें असें नाहीं; पण त्याच्या स्पष्टत्वाची दिशा वेगळी असते. या जगांत जो तो आपापल्यापरी चांगलाच आहे. लहान मुलाची जोपासना करतांना जी शांति, जी सहनशक्ति आणि जें प्रेम स्त्री दाखविते ते किती पुरुषांच्या ठिकाणी तुम्हांस आढळेल ? पुरुषांच्या ठिकाणी कार्य करण्यास लागणाऱ्या धैर्याची वाढ झाली आहे, तर स्त्रीच्या ठिकाणी सहनशीलतेस लागणारे धैर्य आहे. स्त्रीच्या ठिकाणी कर्तृत्वशीलतेस लागणारा जोम नाही, तर पुरुषाच्या ठिकाणी दीर्घ सहनशीलतेस लागणारें धैर्य नाही. विश्वाच्या रचनेत सर्वत्र कांटेतोलपणा आढळतो. या कांटेतोलपणाने हे सारे विश्व इतके व्यापलें आहे की आपलें माणुसपण कायम राखण्याच्या कार्यात एखाद्या क्षुद्र किड्याचाही उपयोग होतो असें उद्या कोणी म्हणूं लागला तर तें खोटें असें आपणास छातीवर हात ठेवून सांगता येणार नाही. मी कदाचित् एक मोठा सत्पुरुष असेन, आणि दुसरा एखादा दुर्जन असेल; पण त्या अत्यंत दुर्गुणी मनुष्याच्याही अंगी एखादा सगुण असा असेल की जो माझ्या ठिकाणी स्वप्नांतसुद्धा आढळावयाचा नाही. या गोष्टीचा प्रत्यय रोजच्यारोज मला येत असतो. एखाद्या रानवट मनुष्याकडे पहा. त्याच्या शरिराची ती गोटी पाहिली की माझ्या या क्षुद्र देहाची लाज मला वाटू लागते. त्याच्यासारखें पिळदार शरीर मला असते तर किती बरे झाले असते असे माझ्या मनांत आल्यावांचून राहत नाही. त्याच्या मर्जीस येईल तें आणि वाटेल तितकें तो<noinclude></noinclude>
lobobxbf00glnsyzolds1mntzf11ppt
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२२
104
66687
232843
162296
2026-07-03T05:58:29Z
कल्पनाशक्ती
3813
232843
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]| अभ्यास.|११७ }}
{{rule}}</noinclude>खातपीत असतो. रोगाचे स्वप्नसुद्धा त्याला पडत नाहीं; आणि एखाद्या रोगाने त्रास दिला नाही असा एक क्षणसुद्धा माझ्या आयुष्यांत जात नाही. आतां माझ्या डोक्यांत मेंदू कदाचित् अधिक असेल; पण रोगाच्या यातना सुरू झाल्या की 'जळो तो मेंदु, तो त्या रानटी मनुष्याला देऊन त्याचे शरीर मी मोठ्या आनंदाने घेईन' असे विचार मनात येऊ लागतात. लाटा आणि खाडे यांनीच विश्व निर्माण झाले आहे. एखाद्या ठिकाणी मोठी लाट दिसत असली तर तितक्याच प्रमाणाचा खाडा कोठे तरी असला पाहिजे हे निश्चित होय. कोठे तरी खाडा पडल्यावांचून लाट उठणे शक्य नाही. अशा रीतीने या विश्वांत समतोलपणा सर्वत्र आहे. महत्वाची अशी एखादी वस्तु तुमच्यापाशी असेल, तर तुमच्या शेजाऱ्याजवळ दुसरी एखादी वस्तु तितक्याच महत्वाची असते. याकरितां स्त्रीपुरुषांचे परीक्षण कर्तव्य असतां दोघांच्या मोठेपणाची मापे वेगवेगळी घेतली पाहिजेत हे उघड आहे. दोघांचेही परीक्षण त्यांच्या त्यांच्या कार्यकक्षेत केले पाहिजे. कोणालाही आपला प्रांत सोडून दुसऱ्याचे कार्य करता यावयाचे नाही. 'जेनुं काम तेने थाय' ही म्हण येथे लक्ष्यात ठेवली पाहिजे. आपल्या मार्गाने दुसरा चालत नाही, म्हणून तो वाईट असें म्हणण्याचा अधिकार कोणासही नाही. जुन्या लोकांच्या चालीरीतीत यत्किंचित् बदल कोणी केला की 'जग बुडालें रे बुडाले' असे ते म्हणूं लागतात. अशा लोकांना आपण वेडे म्हणत असतो; पण आपल्या स्वतःच्या मताप्रमाणे दुसऱ्या कोणासही दुष्ट समजणारा प्रत्येक मनुष्य याच प्रकारचा वेडा होय. जग बुडालें ही ओरड आज कित्येक शतके आपण ऐकत आहों; पण अद्यापि जग पूर्वीसारखेच चालू आहे. निग्रो गुलामांना मुक्त करावे अशी चळवळ तुमच्या या अमेरिकेंत प्रथम सुरू झाली तेव्हां अमेरिका आतां खास बुडणार असा कोलाहल पुष्कळांनी केला होता; पण अमेरिकेची भरभराट पूर्वीसारखीच आहे हे तुम्ही आम्ही पाहत आहोंच. शूद्र वर्गाला शिक्षण दिलें की जग खास बुडेल असे भाकित पुष्कळांनी केलें होतें! पण हे भविष्य कितपत खरे झाले? खालचा वर्ग सुशिक्षित झाला तर जग बुडत नाहींच, पण उलट त्याचे थोडेबहुत हितच होते असा अनुभव मात्र येतो. थोड्या वर्षांमागें इंग्लंडात एक ग्रंथकार होऊन गेला. इंग्रज मजुरांच्या रोजमुऱ्याचे दर वाढत असून त्यामुळे व्यापार कमी होत आहे आणि इंग्लंड देश लव-<noinclude></noinclude>
bnjnpvhrup01ubu1fhlm5597caejy7s
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२३
104
66688
232844
162298
2026-07-03T06:00:56Z
कल्पनाशक्ती
3813
232844
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|११८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>करच रसातळास जाणार अशा अर्थाचे प्रतिपादन या ग्रंथकाराने केले होते. इंग्रज मजुरापेक्षा जर्मन मजूर कमी पैशाने मिळतो असे या ग्रंथकाराचे म्हणणे होते. या लेखाने बरीच गडबड उडविली होती. सरकारने पंच नेमून या प्रकरणाची चौकशी केली तेव्हां जर्मन मजूर एकंदरीने अधिक कमाई करतो असे निदर्शनास आले. याचे कारण हेच की जर्मन मजूर अधिक शिकलेला असतो. शूद्रांना शिक्षण दिले की जग बुडेल असें ठासून सांगणारे बुढ्ढे ज्योतिषी आमच्या हिंदुस्थानांत जागोजाग आहेत. खालच्या वर्गाला अज्ञानधिकारांत ठेवण्याचा विडाच जणूं काय या लोकांनी उचललेला आहे; आणि हेच लोक स्वतःस ज्ञानवृक्षाचा मोहोर म्हणवीत असतात! ज्ञानरूपी विषाचा गुण असा काही विलक्षण आहे की वरिष्ठ वर्गाला तें मुळीच इजा करीत नाही, आणि खालच्या वर्गाला मात्र त्याची बाधा होते असेंच जणूं काय त्यांचे मत आहे! असो; पण हे विषयांतर बाजूस ठेवून आपल्या प्रस्तुत विषयाकडे आपण वळू.

{{gap}}सूक्ष्मेंद्रिय शास्त्रांतील प्रमेयें प्रत्यक्ष व्यवहार्य आहेत की नाहीत हे आपणास पाहावयाचे आहे. हा विषय आमच्या हिंदुस्थानाला काही नवा नाही. सूक्ष्मेद्रिय शास्त्राचा अभ्यास फार प्राचीनकाळीही तेथे चालू होता. ख्रिस्त जन्माला येण्याच्या आधी सुमारे १४०० वर्षे भगवान् पतंजलि या नांवाचे एक तत्त्वदर्शी मुनि तेथे होऊन गेले. सूक्ष्मेंद्रियशास्त्राने व प्राचीनकाळच्या प्रत्यक्ष अनुभवाने लागलेले सारे शोध त्यांनी एकत्र केले. जग जन्माला येऊन दोन तीन हजार वर्षे झाली हा बायबलांतील उत्पत्तिप्रकरणांतील शोध अक्षरशः चुकीचा आहे हे प्रथम ध्यानात ठेवा. जग अत्यंत जुनाट आहे. नवा करार जन्मास आला तेव्हां, म्हणजे सुमारे १८०० वर्षांपूर्वी समाजघटनेस सुरवात झाली असे मत पाश्चात्य देशांत प्रचलित आहे. नव्या करारापूर्वी जगांत सारी मनुष्ये रानटी होती असें पाश्चात्य लोकांस वाटते. पाश्चात्य देशांपुरतें मात्र हे म्हणणे खरे असेल; पण साऱ्या जगाला अनुलक्षून असलें विधान करणे वेडेपणाचे आहे. एके वेळी लंडनमध्ये माझी व्याख्याने सुरू असतां एक बुद्धिमान तरुण गृहस्थ माझ्याशी वादविवाद करीत असे. एके दिवशी असाच वाद करतां करतां बुद्धिवादाची आपली सारी पुंजी संपली असें पाहून तो मला म्हणाला, "पण कांहो, तुमचे ते ऋषी आमच्या इंग्लंडांत कां<noinclude></noinclude>
6dvzft7dq02titazegeg7nol55s1sfe
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१२४
104
66689
232845
162299
2026-07-03T06:04:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
232845
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Shinde Sonal" />{{rh|खंड ]| अभ्यास.|११९ }}
{{rule}}</noinclude>आले नाहीत. येथे येऊन त्यांनी आम्हांस ज्ञानदान का केलें नाहीं" मी उत्तर दिले, "कारण त्यावेळी देश अथवा राष्ट्र या रूपाने इंग्लंडाला अस्तित्वच नव्हते. येथे येऊन त्यांनी काय झाडांस उपदेश द्यावयाचा होता?"

{{gap}}सुप्रसिद्ध अमेरिकन तत्त्ववेत्ते इंगरसोल मला एकदा म्हणाले, "पन्नास वर्षांपूर्वी तुम्ही येथे आला असतां व धर्मावर व्याख्याने तुम्ही दिली असती तर तुम्हांला लोकांनी झाडाला लटकावून फाशी दिले असते, तुम्हांला दगडमार केला असता, किंवा त्यांनी तुम्हाला जिवंत जाळून टाकलें असतें."

{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी १४०० वर्षांवर जगांत संस्कृतीच नव्हती हे म्हणणे निःसंशय खोटें आहे. जुन्या काळी संस्कृतीला अस्तित्व नव्हते असे म्हणण्यास योग्य कारण कांहींच दाखविता येत नाही. फार काय पण रानटी अवस्था आधी की सुधारणा आधी होती या प्रश्नाचाही पूर्ण निकाल अद्यापि लागलेला नाही. मनुष्याच्या प्रथमावस्थेत तो रानटी स्थितीत असून मग तो हळुहळु सुधारत गेला की प्रथम सुसंस्कृतावस्थेत असतां अवनत दशा पावून रानटी स्थितीला तो पोहोंचला याचे निश्चित उत्तर अद्यापि कोणी दिलेले नाही. रानटी अवस्थेतून मनुष्याची सुधारणा झाली हे सिद्ध करण्यासाठी जी प्रमाणे तुम्ही उभी करतां, त्याच प्रमाणांनी आम्ही त्याच्या उलट सिद्धांत सिद्ध करून दाखवितो. रानटी मनुष्य म्हणजे संस्कृत मनुष्याची अवनत आवृत्ति. केवळ रानटी अवस्थेतून मनुष्यप्राणी सध्याच्या सुधारलेल्या स्थितीला पोहोचला आहे हे म्हणणे चिनी लोकांना तरी कधीच पटावयाचे नाहीं; कारण, याच्याविरुद्ध स्थिति त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांतली आहे. जेव्हां केवळ अमेरिकन संस्कृतीसंबंधी तुम्ही बोलत असतां जेव्हां तेथील मूळच्या रहिवाशांस तुम्ही विसरता. तुमच्या मनांत केवळ स्वतःच्या गौरकाय कुलाचा विचार मात्र असतो. स्वतःचे कुल येथे चिरस्थायी कसे होईल आणि वाढीस कसे लागेल इतकेंच तुम्हांस पाहावयाचे असते.

{{gap}}हिंदुलोकांची अवनति गेली सातशे वर्षे सुरू आहे; तेच लोक प्राचीन-काळी अत्यंत संस्कृतावस्थेत होते असे मानण्यास तुमची बुद्धि इतकी का कचरते? ही गोष्ट अगदी साहजीकपणे पटावी इतकी ती सोपी आहे; आणि याचे मुख्य कारण हेच की याच्या उलट स्थिति होती असें निश्चयाने सिद्ध करणे कोणास शक्य नाही. रात्रींच्या रात्रीत संस्कृतावस्था जमिनीतून उग-<noinclude></noinclude>
qi6b9jy7ro88f6grfcoaab1thzn8zwz
अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf
106
104084
232832
232752
2026-07-02T15:38:27Z
कल्पनाशक्ती
3813
232832
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 34="मदुरा" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 51="कोडैकनाल" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 69="डिंडिंगल आणि पालघाट" 76="पालघाट - कोइमतुर" 84="नीलगिरीवरील विलायत" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो" 107="दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला" 113="फोटो" 114="फोटो" 123="जबलपूर" 125="फोटो" 126="फोटो" 129="फोटो" 130="फोटो" 133="फोटो" 134="फोटो" 161="फोटो" 162="फोटो" 171="फोटो" 172="फोटो" 203="फोटो" 204="फोटो" 207="फोटो" 208="फोटो"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
0z4bqspg5uaqt4c9n23xaz5g8g6z02c
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१०९
104
110880
232827
2026-07-02T13:27:11Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "आम्हांला झालें. शेवटी एकदांची आमची मोटार आली व आम्ही मोठ्या प्रमुदित मनानें मोटारीत बसलों व एकदांची मोटार चालू झाली. आठ मैलांचा मोटारीचा प्रवास तो काय? हां हां म्हणतां म्हणतां त..."
232827
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh|दक्षिण काशी: श्रवणबेलगोला|८५}}</noinclude>आम्हांला झालें. शेवटी एकदांची आमची मोटार आली व आम्ही मोठ्या प्रमुदित मनानें मोटारीत बसलों व एकदांची मोटार चालू झाली. आठ मैलांचा मोटारीचा प्रवास तो काय? हां हां म्हणतां म्हणतां तो प्रवास सरला व आम्ही '''श्रवणबेलगोलाच्या प्रवाशी गृहाशीं''' (Traveller's bunglow) आलों. म्हैसूरच्या लक्ष्मीपतीयांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीं या गृहांत उतरलों. इतके होत आहे तो अडीच वाजून गेले. प्रवाशीगृहाच्या रखवालदाराने आम्हांला एक खोली उघडून दिली व त्यांत आम्हीं आपलें सामान ठेविलें व प्रवाशी पोशाख उतरून जरा मोकळे झालों व लगेच हातपायतोंड धुतलें. तेव्हां आमचा प्रवासाचा शीण जाऊन आम्हांला हुशारी वाटली.

{{gap}}'''श्रवणबेलगोला''' मठाचे व्यवस्थापक न्यायतीर्थ सुभय्या शास्त्रीजी यांच्या नांवचें म्हैसूराहून आणलेलें पत्र रखवालदाराबरोबर त्यांचेकडे पाठविलें व आम्ही त्यांच्या उत्तराची किंवा निरोपाची वाट पहात बसलों. बराच वेळ झाला तरी उत्तराचा व निरोपाचा पत्ता नाही. पण इतक्यांत एक तरुण विद्यार्थी चहाची किटली व कपबशा घेऊन आला व म्हणाला, “ शास्त्रीजीनीं मला पुढे पाठविलें आहे. ते थोड्या वेळानें
इकडेच येणार आहेत; आपणांला चहा घेण्यास त्यांनीं सांगितलें आहे.” शास्त्रीजीकडून आलेल्या पाहुणचाराचा आम्हीं आनंदानें स्वीकार केला हे सांगावयास नकोच. आमचा चहा पिऊन झाल्याबरोबर तो विद्यार्थी परत गेला व आम्हीं शास्त्रीजीची पुनः वाट पहात बसलों. बराच वेळ झाला; दिवसही पुष्कळ खालीं गेला; तरी स्वामीजीचा पत्ता नाहीं. जर महंमद पर्वताकडे येत नसला (किंवा त्याला येण्यास उशीर लागत
असला) तर पर्वतानें महंमदाकडे जावें हें बरें, असें मनांत आणून आम्हीच '''श्रवणबेलगोला''' मठाकडे जाण्यास निघालों.

{{gap}}'''श्रवणबेलगोला''' हे गांव दुरून दिसणाऱ्या दोन डोंगरांच्या चिंचोळ्या चिळणींत वसले असल्यामुळे त्या दोन डोंगरांना चिकटून-<noinclude></noinclude>
o43wm7552zud3lssefspw1k3059ion8
232828
232827
2026-07-02T13:28:27Z
JayashreeVI
4058
232828
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{rh|दक्षिण काशी: श्रवणबेलगोला|८५}}}}</noinclude>आम्हांला झालें. शेवटी एकदांची आमची मोटार आली व आम्ही मोठ्या प्रमुदित मनानें मोटारीत बसलों व एकदांची मोटार चालू झाली. आठ मैलांचा मोटारीचा प्रवास तो काय? हां हां म्हणतां म्हणतां तो प्रवास सरला व आम्ही '''श्रवणबेलगोलाच्या प्रवाशी गृहाशीं''' (Traveller's bunglow) आलों. म्हैसूरच्या लक्ष्मीपतीयांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीं या गृहांत उतरलों. इतके होत आहे तो अडीच वाजून गेले. प्रवाशीगृहाच्या रखवालदाराने आम्हांला एक खोली उघडून दिली व त्यांत आम्हीं आपलें सामान ठेविलें व प्रवाशी पोशाख उतरून जरा मोकळे झालों व लगेच हातपायतोंड धुतलें. तेव्हां आमचा प्रवासाचा शीण जाऊन आम्हांला हुशारी वाटली.

{{gap}}'''श्रवणबेलगोला''' मठाचे व्यवस्थापक न्यायतीर्थ सुभय्या शास्त्रीजी यांच्या नांवचें म्हैसूराहून आणलेलें पत्र रखवालदाराबरोबर त्यांचेकडे पाठविलें व आम्ही त्यांच्या उत्तराची किंवा निरोपाची वाट पहात बसलों. बराच वेळ झाला तरी उत्तराचा व निरोपाचा पत्ता नाही. पण इतक्यांत एक तरुण विद्यार्थी चहाची किटली व कपबशा घेऊन आला व म्हणाला, “ शास्त्रीजीनीं मला पुढे पाठविलें आहे. ते थोड्या वेळानें
इकडेच येणार आहेत; आपणांला चहा घेण्यास त्यांनीं सांगितलें आहे.” शास्त्रीजीकडून आलेल्या पाहुणचाराचा आम्हीं आनंदानें स्वीकार केला हे सांगावयास नकोच. आमचा चहा पिऊन झाल्याबरोबर तो विद्यार्थी परत गेला व आम्हीं शास्त्रीजीची पुनः वाट पहात बसलों. बराच वेळ झाला; दिवसही पुष्कळ खालीं गेला; तरी स्वामीजीचा पत्ता नाहीं. जर महंमद पर्वताकडे येत नसला (किंवा त्याला येण्यास उशीर लागत
असला) तर पर्वतानें महंमदाकडे जावें हें बरें, असें मनांत आणून आम्हीच '''श्रवणबेलगोला''' मठाकडे जाण्यास निघालों.

{{gap}}'''श्रवणबेलगोला''' हे गांव दुरून दिसणाऱ्या दोन डोंगरांच्या चिंचोळ्या चिळणींत वसले असल्यामुळे त्या दोन डोंगरांना चिकटून-<noinclude></noinclude>
0yk0w8gnd18wh3upuxtskb3dvn58q25
232829
232828
2026-07-02T13:31:35Z
JayashreeVI
4058
232829
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{rh||दक्षिण काशी: श्रवणबेलगोला|८५}}</noinclude>आम्हांला झालें. शेवटी एकदांची आमची मोटार आली व आम्ही मोठ्या प्रमुदित मनानें मोटारीत बसलों व एकदांची मोटार चालू झाली. आठ मैलांचा मोटारीचा प्रवास तो काय? हां हां म्हणतां म्हणतां तो प्रवास सरला व आम्ही '''श्रवणबेलगोलाच्या प्रवाशी गृहाशीं''' (Traveller's bunglow) आलों. म्हैसूरच्या लक्ष्मीपतीयांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीं या गृहांत उतरलों. इतके होत आहे तो अडीच वाजून गेले. प्रवाशीगृहाच्या रखवालदाराने आम्हांला एक खोली उघडून दिली व त्यांत आम्हीं आपलें सामान ठेविलें व प्रवाशी पोशाख उतरून जरा मोकळे झालों व लगेच हातपायतोंड धुतलें. तेव्हां आमचा प्रवासाचा शीण जाऊन आम्हांला हुशारी वाटली.

{{gap}}'''श्रवणबेलगोला''' मठाचे व्यवस्थापक न्यायतीर्थ सुभय्या शास्त्रीजी यांच्या नांवचें म्हैसूराहून आणलेलें पत्र रखवालदाराबरोबर त्यांचेकडे पाठविलें व आम्ही त्यांच्या उत्तराची किंवा निरोपाची वाट पहात बसलों. बराच वेळ झाला तरी उत्तराचा व निरोपाचा पत्ता नाही. पण इतक्यांत एक तरुण विद्यार्थी चहाची किटली व कपबशा घेऊन आला व म्हणाला, “ शास्त्रीजीनीं मला पुढे पाठविलें आहे. ते थोड्या वेळानें
इकडेच येणार आहेत; आपणांला चहा घेण्यास त्यांनीं सांगितलें आहे.” शास्त्रीजीकडून आलेल्या पाहुणचाराचा आम्हीं आनंदानें स्वीकार केला हे सांगावयास नकोच. आमचा चहा पिऊन झाल्याबरोबर तो विद्यार्थी परत गेला व आम्हीं शास्त्रीजीची पुनः वाट पहात बसलों. बराच वेळ झाला; दिवसही पुष्कळ खालीं गेला; तरी स्वामीजीचा पत्ता नाहीं. जर महंमद पर्वताकडे येत नसला (किंवा त्याला येण्यास उशीर लागत
असला) तर पर्वतानें महंमदाकडे जावें हें बरें, असें मनांत आणून आम्हीच '''श्रवणबेलगोला''' मठाकडे जाण्यास निघालों.

{{gap}}'''श्रवणबेलगोला''' हे गांव दुरून दिसणाऱ्या दोन डोंगरांच्या चिंचोळ्या चिळणींत वसले असल्यामुळे त्या दोन डोंगरांना चिकटून-<noinclude></noinclude>
7n4qy6ej8dtixldgoob4noihpxkbon1
232830
232829
2026-07-02T13:32:05Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
232830
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||दक्षिण काशी: श्रवणबेलगोला|८५}}</noinclude>आम्हांला झालें. शेवटी एकदांची आमची मोटार आली व आम्ही मोठ्या प्रमुदित मनानें मोटारीत बसलों व एकदांची मोटार चालू झाली. आठ मैलांचा मोटारीचा प्रवास तो काय? हां हां म्हणतां म्हणतां तो प्रवास सरला व आम्ही '''श्रवणबेलगोलाच्या प्रवाशी गृहाशीं''' (Traveller's bunglow) आलों. म्हैसूरच्या लक्ष्मीपतीयांनी सांगितल्याप्रमाणे आम्हीं या गृहांत उतरलों. इतके होत आहे तो अडीच वाजून गेले. प्रवाशीगृहाच्या रखवालदाराने आम्हांला एक खोली उघडून दिली व त्यांत आम्हीं आपलें सामान ठेविलें व प्रवाशी पोशाख उतरून जरा मोकळे झालों व लगेच हातपायतोंड धुतलें. तेव्हां आमचा प्रवासाचा शीण जाऊन आम्हांला हुशारी वाटली.

{{gap}}'''श्रवणबेलगोला''' मठाचे व्यवस्थापक न्यायतीर्थ सुभय्या शास्त्रीजी यांच्या नांवचें म्हैसूराहून आणलेलें पत्र रखवालदाराबरोबर त्यांचेकडे पाठविलें व आम्ही त्यांच्या उत्तराची किंवा निरोपाची वाट पहात बसलों. बराच वेळ झाला तरी उत्तराचा व निरोपाचा पत्ता नाही. पण इतक्यांत एक तरुण विद्यार्थी चहाची किटली व कपबशा घेऊन आला व म्हणाला, “ शास्त्रीजीनीं मला पुढे पाठविलें आहे. ते थोड्या वेळानें
इकडेच येणार आहेत; आपणांला चहा घेण्यास त्यांनीं सांगितलें आहे.” शास्त्रीजीकडून आलेल्या पाहुणचाराचा आम्हीं आनंदानें स्वीकार केला हे सांगावयास नकोच. आमचा चहा पिऊन झाल्याबरोबर तो विद्यार्थी परत गेला व आम्हीं शास्त्रीजीची पुनः वाट पहात बसलों. बराच वेळ झाला; दिवसही पुष्कळ खालीं गेला; तरी स्वामीजीचा पत्ता नाहीं. जर महंमद पर्वताकडे येत नसला (किंवा त्याला येण्यास उशीर लागत
असला) तर पर्वतानें महंमदाकडे जावें हें बरें, असें मनांत आणून आम्हीच '''श्रवणबेलगोला''' मठाकडे जाण्यास निघालों.

{{gap}}'''श्रवणबेलगोला''' हे गांव दुरून दिसणाऱ्या दोन डोंगरांच्या चिंचोळ्या चिळणींत वसले असल्यामुळे त्या दोन डोंगरांना चिकटून-<noinclude></noinclude>
77fsh5aonienwhpt2uszqt4ikmdh9ej
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/११०
104
110881
232831
2026-07-02T13:32:56Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "८६ काशी - राममेवर यात्रा गांवच्या घरांच्या दोन रांगा आहेत व मधून एक सरळ रस्ता आहे. त्या रस्त्याने आम्ही गावच्या मध्यावर जातों तोंच सुभय्याशास्त्री आम्हांला सामोरे आले व म्हणाले,..."
232831
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>८६
काशी - राममेवर यात्रा
गांवच्या घरांच्या दोन रांगा आहेत व मधून एक सरळ रस्ता आहे.
त्या रस्त्याने आम्ही गावच्या मध्यावर जातों तोंच सुभय्याशास्त्री
आम्हांला सामोरे आले व म्हणाले, " मी आपल्याकडेच यावयास
निघालो होतों. आपलें पत्र मला मिळालें. तेव्हां बरेंच ऊन होतें म्हणून
मी प्रवाशीगृहाकडे चहा देऊन आमच्या विद्यार्थ्याला पाठविलें व
ऊन खालीं झाल्यावर मी निघणार होतों. मला मठांत थोडें काम होतें.
आपल्या पत्रावरून आपल्याला दुसरा दिवस राहण्यास सवड
नव्हती. म्हणून मी आमच्या स्वामीना आपल्या आगमनाची
बातमी दिली व भेटीची वेळ ठरविली. शिवाय चांदणे चांगलें
असल्यामुळे इथला एक डोंगर तरी रात्रीं चांदण्यांत पाहण्याची
मौज आहे. येथली पवित्र स्थानें पाहून झाल्यावर रात्रीच्या शांत व
स्वस्थ वेळीं त्यांनीं आपल्याला भेटीला बोलाविलें आहे. आज सायं-
काळचें भोजन आपण आमच्या घरीं करावें व मग स्वामीची भेट
घेऊन प्रवाशीगृहाला झोंपेकरितां जावें. सकाळीं आरसीकेरीला
जाणारी मोटार बस आपल्याला प्रवाशीगृहांतून घेऊन जाईल. तेव्हां
आतां प्रथम आमच्या घरीं चलावें. तेथून आपण विंध्यगिरी (दोडा
बेटा, मोठा डोंगर) पाहण्यास जाऊं. परत येईतों सायंकाळ होईल, मग
थोडी विश्रांती घेऊन चन्द्रगिरि ( चिक्कबेटा, धाकटा डोंगर ) चांद-
ण्यांत पहाण्यास जाऊं. परत आल्यावर आपण भोजन करावें व लाग-
लीच स्वामीच्या भेटीला जाऊ. तदनंतर आपण प्रवाशीगृहांत जावें. "
सुभय्या शास्त्रीजीचें हें भाषण ऐकून त्यांना आमच्याकडे येण्यास
कां वेळ लागला हॅ न सांगताच समजून आलें. आम्ही मनांतल्या मनांत
सुभय्या शास्त्र्यांचे आभार मानले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणें प्रथम
आम्ही त्यांचे बिऱ्हाडीं गेलों. दोन्ही डोंगर पवित्र समजले गेले
असल्यामुळे पादत्राण घालून डोंगर चढण्याची वहिवाट नाहीं
म्हणून आम्ही पादत्राणें शास्त्रीजीच्या घरींच ठेविलीं व अनवाणी
दोडाबेटा डोंगराकडे निघालो. उजव्या हातास डोंगराचे पाय-<noinclude></noinclude>
oa7scnelyfapyoccujuj90j5gkoxijw