विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.10
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf
106
67086
232999
203526
2026-07-09T15:51:36Z
कल्पनाशक्ती
3813
232999
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[माझा जन्मभरचा एक उद्योग]]
|Language=mr
|Volume=
|Author=नरसिंह चिंतामण केळकर
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=अनाथ विद्यार्थी गृह प्रकाशन
|Address=पुणे
|Year=1959
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist 8="माझा जन्मभराचा एक उद्योग" />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
rvioyrz6d3dbvrhcm7k3sbnbzm699fb
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४
104
98819
233001
209735
2026-07-09T16:01:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233001
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude></br></br>
{{xx-larger|{{center|प्रस्तावनेदाखल चार शब्द}}}}
{{gap}}सोळा वर्षांपूर्वी 'सह्याद्रि' मासिकाच्या एका संबंध अंकांत (सह्याद्रि सप्टेंबर १९४२) कै. न. चिं. केळकर यांनीं आपल्या वाङ्मयसेवेबद्दल सुमारें दीडशें पृष्ठें होईल एवढा एक विस्तृत लेख लिहिला होता. त्याला त्यांनीं " '''माझा जन्मभरचा एक उद्योग''' " असें नांव दिलें होतें. तो लेख आज या पुस्तकाचे रूपानें पुनर्मुद्रित केला आहे. शाळा कॉलेजांत लागणाऱ्या क्रमिक पुस्तकांत तात्यासाहेब केळकर यांच्या वाङ्मयांतील उतारे नित्य आढळतात. पण त्या लेखासंबंधी, लेखकासंबंधी किंवा त्याच्या वाङ्मयसेवेसंबंधी निश्चित अशी माहिती विद्यार्थ्यांना फारच थोडी असते; ती माहिती स्वतः ग्रंथकर्त्याकडूनच प्रायः लिहिलेली उपलब्ध झाली तर अधिक बरें, असाहि हें पुस्तक प्रसिद्ध करण्यांत हेतु आहे.<br>{{gap}}केवळ वाङ्मयापुरतीच नव्हे, तर तात्यासाहेबांच्या इतर सार्वजनिक आयुष्याबद्दलहि थोड्याफार माहितीची विद्यार्थ्यांना जरूर असते. याकरिता, परिशिष्टरूपानें चार विस्तृत मुलाखती या पुस्तकांत छापल्या आहेत. त्यांत त्यांच्या सर्व सार्वजनिक व खासगी आयुष्याचा मार्मिक आढावा संभाषणरूपानें आलेला आहे. "मी कां लिहितों?" हा लेख तात्विक असल्यानें पुस्तकाच्या शेवटीं आलेला आहे. तात्पर्य, कालनिर्देशाचे दृष्टीनें यांतील मुलाखती १९३२ सालच्या; "माझा जन्मभरचा एक उद्योग" हें सह्याद्रींतील लिखाण १९४२ सालचें; आणि "मी कां लिहितों?" हा लेख १९४७ सालचा. यांप्रमाणें, त्यांच्या वाङ्मयविषयक चरित्रासंबंधींचा सर्व मजकूर या पुस्तकांत ग्रथित केलेला आढळेल.</br></br>
<center>
{| {{brace table parameters}}
|style="text-align:center;"|पुणें{{gap}}||{{brace|r|t}}||
|-
|||{{brace|r|m}}||{{gap}}{{gap}}'''का. न. केळकर.'''
|-
|style="text-align:center;"|१ नोव्हेंबर १९५९.{{gap}}||{{brace|r|b}}||
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
rzfofrtqlzxs5qtnm2ik2natyif1tir
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२७
104
100901
233002
209755
2026-07-09T16:05:42Z
कल्पनाशक्ती
3813
233002
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|२०]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>माझे आवडते ग्रंथकार मेकॉले, गोल्ड्स्मिथ, ऍडिसन, गिबन, व अिमरसन हे होते. त्यानंतर अितर अनेक अिंग्रजी ग्रंथकार माझ्या वाचण्यांत आले, पण ते वरील आवडत्या ग्रंथकारांची जागा कधीहि घेअूं शकले नाहीत. मी सुमारें वीस वर्षें 'मराठ्या'चा प्रत्यक्ष संपादक होतों. यामुळे त्यांत किंवा अितर प्रसंगीं, निबंध व भाषणे यांच्या रूपानें, मी अिंग्रजी लेख किती तरी लिहिले. आणि बारा वर्षांपूर्वीं त्यांतील निवडक अेक हजार पानें छापूनहि काढलीं आहेत. तथापि अिंग्रजी ही किती केलें तरी परभाषा ! तिच्यांत आमची मजल ' सरड्याची धाव कुंपणापर्यंत' या न्यायानेच जावयाची. मी प्रयत्न केला असता तर अिंग्रजींतहि अेखादा वाङमय ग्रंथ लिहूं शकलों
असतों. तथापि प्रस्तुत समालोचनांत माझ्या वाङमयाची चिकित्सा करतांना अिंग्रजी भाषा वगळूनच मी लिहिणार आहें. कारण परकी भाषा हस्तगत होणें हें कठीण असतें. कोणाहि हिंदी लेखकाने आपण अिंग्रजी चांगलें लिहितों असें मानणें हें धाडसच होय. कारण नळराजाच्या टाचेवरील तिळमात्र जागेतून कलि नळाच्या शरीरांत शिरला, त्याप्रमाणें अुलट अेखाद्या शब्दप्रयोगांतून हिंदी लेखकाचें अिंग्रजी भाषेचें हास्यास्पद अज्ञान हटकून बाहेर पडावयाचें ! आम्ही हिंदी लोक अितकें तरी चांगलें अिंग्रजी लिहितों हीच गोष्ट मोठी समजावी. म्हणून मी स्वतःला चांगलें अिंग्रजी लिहिणारा असें समजत नाही. तथापि, वेळीं अवेळीं मला अद्देशून 'पुणेकरी' अिंग्रजी म्हणून थट्टा करणाऱ्या माझ्या मुंबअीकर निंदकांपेक्षा मी अधिक चांगलें अिंग्रजी लिहितों असें आत्मविश्वासाने म्हणतों.
{{gap}}(२७) बी. अे. ची परीक्षा पास होऊन साता-यास आल्यावर माझ्या कविता-लेखनव्यवसायालाहि सुरुवात झाली. त्यांतील दोन पद्यें याखाली देतों. १८९२ त लिहिलेली हीच माझी पहिली मराठी कविता-</br>
{{center|'''चंद्राला पाहून'''}}
{{gap}}'''रजनिवल्लभा तुला नभःपथपथिका वंदन करी'''</br>
{{gap}}'''निबिडघनावृत अंबरमार्गा आक्रमिसी झडकरी ।'''</br>
{{gap}}{{gap}}'''अुदासवाणें तुझें हिमकरा पाहत मुख हें फिकें'''</br>
{{gap}}{{gap}}'''परि मम हृदयीं अतुल होतसे सौख्यचि जाणे निकें ॥'''{{nop}}<noinclude></noinclude>
4td1yuboy37kvcm1g2yk3xxiz528lty
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२८
104
100902
233003
209756
2026-07-09T16:06:26Z
कल्पनाशक्ती
3813
233003
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[२१}}
{{rule}}</noinclude>{{gap}}'''समचित्ताने गमे अुदारा मानव-लीला बरी'''</br>
{{gap}}'''पाहसि अपुल्या विमललोचनीं तवचि सुजनता खरी ॥'''</br>
{{gap}}{{gap}}'''अवनितलीं मातले पहा हे कलह तशा आपदा'''</br>
{{gap}}{{gap}}'''परि समतेने सकलां सुखवुनि देसि हिमकरीं मुदा ॥'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{x-larger|'''भिकारी'''}}</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''पडली सांज पहा भूतळीं'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''गगनीं नक्षत्रें अुगवलीं'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''अंधकार करि धुंद दिशा'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''जग शून्यवदनता आली ॥'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''दिनभरि फिरलो चक्रापरी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''दया कोणिहि न मजवरि करी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''श्रांत चरण जाहले किती तरि'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''हरहर शिणलों भारी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''सुजनसे आपणा पाहुनी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''आलों या द्वारीं ॥'''</br>
{{gap}}(२८) १८९३ सालीं सातारचे पुढारी दादासाहेब करंदीकर व बळवंतराव सहस्रबुद्धे, वकीलद्वय, हे राष्ट्रीय सभेहून परत आले तेव्हां त्यांच्या सत्कारसभेंत म्हणण्याकरिता मी केलेल्या कवितांपैकी आर्या--</br>
{{gap}}{{gap}}'''हिंदुस्थानवनाच्या कोनामधि राष्ट्रसदस तरु फुलला'''
{{gap}}{{gap}}'''परि करंदिकर भ्रमरें आम्हां मकरंद येथ सेवविला ॥'''
{{gap}}{{gap}}'''अितक्या सुदूर देशी राष्ट्रसभा जान्हवी प्रकट झाली'''
{{gap}}{{gap}}'''तत्शैत्त्य पावनत्वें बलवंत समीरणें अम्हां दिधली ॥'''
{{gap}}यांत त्या दोघां गृहस्थांचें विशिष्ट स्वभावगुणवर्णन अंतस्थ होतें तें लोकांना फार पटलें. सत्येंद्रनाथ टागोर साहेब, सेशन जज्ज सातारा, यांच्या मुलीला शिकविण्याकरिता मी अनेक मराठी पद्यें तयार केलीं होतीं. त्यांतलें सीतापरित्याग' हें अेक आजहि आठवतें-{{nop}}<noinclude></noinclude>
g51k0qizqqw7ptfay5c07t7eukk4xjm
233004
233003
2026-07-09T16:07:11Z
कल्पनाशक्ती
3813
233004
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[२१}}
{{rule}}</noinclude>{{gap}}'''समचित्ताने गमे अुदारा मानव-लीला बरी'''</br>
{{gap}}'''पाहसि अपुल्या विमललोचनीं तवचि सुजनता खरी ॥'''</br>
{{gap}}{{gap}}'''अवनितलीं मातले पहा हे कलह तशा आपदा'''</br>
{{gap}}{{gap}}'''परि समतेने सकलां सुखवुनि देसि हिमकरीं मुदा ॥'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{x-larger|'''भिकारी'''}}</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''पडली सांज पहा भूतळीं'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''गगनीं नक्षत्रें अुगवलीं'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''अंधकार करि धुंद दिशा'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''जग शून्यवदनता आली ॥'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''दिनभरि फिरलो चक्रापरी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''दया कोणिहि न मजवरि करी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''श्रांत चरण जाहले किती तरि'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''हरहर शिणलों भारी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''सुजनसे आपणा पाहुनी'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}{{gap}}'''आलों या द्वारीं ॥'''</br>
{{gap}}(२८) १८९३ सालीं सातारचे पुढारी दादासाहेब करंदीकर व बळवंतराव सहस्रबुद्धे, वकीलद्वय, हे राष्ट्रीय सभेहून परत आले तेव्हां त्यांच्या सत्कारसभेंत म्हणण्याकरिता मी केलेल्या कवितांपैकी आर्या--</br>
{{Block center|<poem>'''हिंदुस्थानवनाच्या कोनामधि राष्ट्रसदस तरु फुलला'''
'''परि करंदिकर भ्रमरें आम्हां मकरंद येथ सेवविला ॥'''
'''अितक्या सुदूर देशी राष्ट्रसभा जान्हवी प्रकट झाली'''
'''तत्शैत्त्य पावनत्वें बलवंत समीरणें अम्हां दिधली ॥'''</poem>}}
{{gap}}यांत त्या दोघां गृहस्थांचें विशिष्ट स्वभावगुणवर्णन अंतस्थ होतें तें लोकांना फार पटलें. सत्येंद्रनाथ टागोर साहेब, सेशन जज्ज सातारा, यांच्या मुलीला शिकविण्याकरिता मी अनेक मराठी पद्यें तयार केलीं होतीं. त्यांतलें सीतापरित्याग' हें अेक आजहि आठवतें-{{nop}}<noinclude></noinclude>
sds1udsyouk4owiwc26ldbokxwj55ht
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३२
104
100927
233010
209760
2026-07-09T16:22:51Z
कल्पनाशक्ती
3813
233010
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग]}}{{right|[२५}}
{{rule}}</noinclude>पण याहीपेक्षा सांगण्यासारखी विशेष नवलाची गोष्ट ही की, त्या पद्यांतलें अेक पद्य स्वतः टिळकांनी रचलें! त्यांच्या सांगण्यावरून दुसरें अेक पद्य मी रचलें यांत विशेष कांही नाही. ता. २० मे सन १९०२ च्या केसरींत, टिळकांचा श्लोक व माझा श्लोक अेकत्र घातलेलें, तें अपूर्व पद्यमय मानपत्र छापलेलें आहे! वाचकांनी तेव्हा तें मानपत्र केसरींत वाचलें, पण त्यांतलें अेक पद्य स्वतः टिळकांनी रचलें ही गुप्त गोष्ट बहुधा कुणाला माहीत नव्हती. ते दोन श्लोक मी मुद्दाम गमतीखातर याखाली देतों :--</br>
{{center|{{larger|'''टिळकांचा श्र्लोक'''}}}}
{{center|( अश्वधाटी )}}
{{Block center|<poem>लोकामध्ये फिरुनि जो का नर विलोका चमत्कृतिरसा ।
ज्याशी स्वबंधुगुण राशी समर्पि रवि भाशीतरश्मि जसा ॥
नाना कला निपुण माना समग्र अभिमानार्ह मेळवि तया ।
नाथा असो सुखद पंथा प्रभो विनवि माथा पदी रचुनिया ॥</poem>}}
{{center|'''माझा श्लोक'''}}
{{center|( स्रग्धरा )}}
{{Block center|<poem>झाला जीच्या सुयोगें प्रिय अरुण जरी व्यंग तो भास्करास ।
केलें जीच्या प्रसादें परगृहिं नकुलें आपुल्या निन्हवास ॥
अैशी ही अश्वविद्या प्रचुर गुणवती जी नला कार्यवाही ।
येथे द्वीपांतरीं हो सुखफलद तुम्हां आमुची प्रार्थना ही ॥</poem>}}
{{gap}}बुद्धिमंत टिळक मनावर घेतील तर काय वाटेल तें करतील, हा जो लोकांचा समज व विश्वास होता तो किती यथार्थ होता, हें या श्लोकासारख्या अगदी क्षुल्लक गोष्टीवरूनहि कळून येण्यासारखें आहे. मात्र टिळकांची काव्यपठडी जुनी. ती या शब्दचित्र श्लोकांतहि दिसून आली आहे. पण सरकस म्हटली म्हणजे त्यांत घोड्यांचा नाच असावयाचाच. म्हणून 'अश्वघाटी' हें वृत्त त्यांनी आपल्या श्लोकाला पसंत केलें, यावरून त्यांचा मार्मिकपणा दिसून आला. आणि खरोखर त्या वृत्ताची रचना अशी<noinclude></noinclude>
g8e4wovdbtm4a8oa9k6bpio74z53o64
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३५
104
100937
233005
209763
2026-07-09T16:11:17Z
कल्पनाशक्ती
3813
233005
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|२८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>अंकाआड कविता घालावयाच्याच असें मी ठरविलें. पण आयत्या वेळीं कविता केसरीच्या संग्रहीं कोठून येणार ? तो झराच आटल्यासारखा झाला होता. म्हणून केसरी अर्ध-साप्ताहिक केल्यापासून, 'अनामिक' या सहीने, स्वतः मीच कविता नव्या रचून त्या घालण्यास सुरवात केली. आणि पहिलीच, सूचक म्हणून, 'गद्य व पद्य' नांवाची व त्या दोन प्रकारांचें
वैशिष्ट्य वर्णन करणारी अशी कविता घातली. ती कविता अशी--</br>
{{center|{{larger|'''गद्य व पद्य'''}}}}
{{Block center|<poem>अेक अर्थ दोन ठायीं{{gap}}{{gap}}गद्य पद्या भेद नाही
गद्य शिव पद्य शक्ति{{gap}}{{gap}}दोन मार्गों अेक भक्ति
अेका जनक-जननीचीं{{gap}}{{gap}}गद्य-पद्य बाळें साचीं
परि करणी अीश्वर करी{{gap}}{{gap}}भेद स्वभावा अंतरीं
मंद जड गद्य दादा{{gap}}{{gap}}पद्य ताअी चंचळ सदा
गद्य स्तिमित दूर बसे{{gap}}{{gap}}पद्य गळां पडुनी हसे
गद्य मानी मनीं कुढे{{gap}}{{gap}}पद्य निर्भीड ओरडे
गद्या मनीं दुरुनी आस{{gap}}{{gap}}पद्य हातें घेअी घास
गद्य पल्लव विस्तृत{{gap}}{{gap}}पद्य पुष्प सुगंधित
गद्य मेघांचें डंबर{{gap}}{{gap}}पद्य वीज झळके वर
गद्य पाथरवटी घडण{{gap}}{{gap}}पद्य रंगीत रोगण
गद्य आखिव-रेखिव भाषा{{gap}}{{gap}}पद्य मुक्तहस्त रेषा
गद्य तर्कग्रस्त भाष्य{{gap}}{{gap}}पद्य स्फूर्तीचें हविष्य
गद्य जेवी दगडी शिळा{{gap}}{{gap}}पद्य जलवीचि-लीला
गद्य अुद्योगाचा सांठा{{gap}}{{gap}}पद्य दैवाचा झपाटा
गद्य विद्वत्तेचें सोंग{{gap}}{{gap}}पद्य तुकयाचा अभंग</poem>}}
{{gap}}कांही दिवसांनी हें कवितेचें नवें सदर केसरी हेतुपुरःसर घालीत आहे असें वाचकांच्या लक्षांत आलें, व मग कांहीं कवि कविता पाठवूं लागले.
{{gap}}(३५) 'लघु' प्रकारच्या लेखांचीं कांही अुदाहरणें - ' शेवटचें लढाअू जहाज', 'दुर्जनसिंग महाराजांची नवसफेड', 'वेताळाचा घाट'
"¹.<noinclude></noinclude>
9ld6qqmfgwtseiudrbmn7tqfaj5z336
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४४
104
101371
233011
209772
2026-07-09T16:29:23Z
कल्पनाशक्ती
3813
233011
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[३७}}
{{rule}}</noinclude>करिता आपल्या पक्षाचे अुमेदवार अुभे केले व डेमोक्रॅटिक स्वराज्य पक्षाचा जाहीरनामा लिहिला. तेव्हा निवडणुकीकरिता मतप्रचारार्थ तो संवाद विनोदी पद्धतीने मी लिहिला. त्यांत मतदारांचें महत्त्व वर्णन करतांना समाजांतील कनिष्ठ व अुपेक्षित वर्गाला महत्त्व दिलें होतें तें सर्वांना आवडलें.<br>
{{gap}}(३८) सन १८९७ - ९९ नंतर सन १९१० पर्यंत माझा संबंध केसरीशीं जबाबदार संपादक म्हणून पुन्हा आला नव्हता. पण तेथपासून १९१४ सालीं टिळक तुरुंगांतून परत येअीपर्यंत, मला आपल्या संपादकीय कल्पना अगदी हव्या तशा अमलांत आणतां आल्या. मी या अवधींत निबंधलेखनाची हौस भरपूर पुरवून घेतली. पुढे १९१४ ते १९२० या सालांत टिळक जाग्यावर होते तरी माझ्या अंतर्व्यवस्थेंत ते लक्ष घालीत नसत. त्यांना हवें तेव्हा ते स्वतः लिहीत, व संपादक वर्गाला सांगून हवें असेल तें लिहवीत. पण अितर अंगांकडे ते लक्ष देत नसत. १९२० नंतर तर मी पूर्ण मुखत्यार असा संपादक व संचालक असल्यामुळे, मला माझ्या कल्पना हव्या तशा अमलांत आणतां आल्या. तसें करतांना वर दर्शविल्याप्रमाणें, मला काय ललित प्रकार
लिहावयाचे ते मी लिहीत असेंच. परंतु अितर संपादक मंडळींच्या अंगीं ललितकलेची आवड असल्यास ती त्यांच्या पद्धतीने त्यांना पुरी करतां यावी, म्हणून त्यांच्याकरिता केसरीचें अेखादे पान राखून ठेवून सर्वस्वी त्यांच्या स्वाधीन करीत असें. हेतु हा की त्यांनी वाटेल त्या पद्धतीने आपला राखीव विषय स्वतः लेख लिहून, किंवा अुतारेहि देअून, सजवावा व मनोरंजक करावा. संपादकीय लेखांत ताठर गंभीरपणा असावा लागतो तो पूर्णपणें न पाळतां, थोडें मोकळ्या मनाने हसतखेळत विनोद करीत, विषयांत विविधता आणून, चित्ताकर्षक रीतीने मांडणी करतां यावी, म्हणून दरआठवड्याला असें राखीव सदर ( फीचर) योजून तें अेकेका अुपसंपादकाकडे दिलें जाअी.हेतु हा की आपला विषय ' फीचर'च्या रूपाने सजवावयाला त्याला अेक महिनाहि मिळावा. आणि अुपसंपादक असतांहि आपणाला कर्तृत्व प्रगट करण्याचें स्वतंत्र स्थान मिळालें त्याचा आपण अुपयोग कसा केला हें संपादकाला दाखवितां यावें. अशा रीतीने केसरीला ललित प्रकारचीं अनेक अंगें चिटकविण्याचा प्रयत्न मी केला तथापि दुर्दैवाने तो फार दिवस टिकला नाही. पण याचीं कारणें सांगून जागा अडविण्याची माझी अिच्छा नाही !<noinclude></noinclude>
i88y4ll41aei9e8jf8ean3xd4plj9s0
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/५६
104
101713
233012
209784
2026-07-09T16:31:10Z
कल्पनाशक्ती
3813
233012
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ ४९}}
{{rule}}</noinclude>तमासगीर मंडळी तुणतुणें खेंचून तिसऱ्या सप्तकांत सूर खेंचून गात व साथ करीत आहेत; कडकडीत डफावर डाव्या हाताची टिचकी व अुजव्या हाताची थाप मारून त्यांचा पुढारी अेकाहून अेक सरस असे पोवाडे आठआठवून म्हणत आहे; आणि सर्व श्रोतेमंडळी तल्लीन होअून तटस्थ झाली आहे.</br>
{{gap}}" या चित्रणांत डफावर थाप पडते; पण डफ कडाडत नाहीं. ठराविक मर्यादेवर तात्यांची लेखणी थांबते; पंत त्या मर्यादेच्या पलीकडे भरारी मारतात. पंतांची शैली श्रद्धा अुत्पन्न करते. त्यामुळे आपणास प्रस्थानत्रयीची अेकवाक्यता पटून, जुनी पुराणांतरीची गोष्ट नवीन रूपांत सापडते. मदनाचें दहन झाल्यावर पुनर्जन्म पूर्वजन्म यांबद्दल जिज्ञासा अुत्पन्न होअून, आपलें लक्ष नव्या सृष्टींतील शब्दांच्या वाढीचा अितिहास आणि त्यामधील कारस्थानें यांकडे जातें.</br>
{{gap}}" तात्यांचे लेखन अफाट ! सर्व विषयांत लेखणी चालविण्याचा त्यांना हव्यास. त्यांच्या ग्रंथांतील अुतारे काढून अेक वाचनीय ग्रंथ होअील. विषय आत्मसात् करण्याकरिता तात्या ग्रंथ लिहितात. तो विषय त्यांना कळतो; पण खोल दृष्टीच्या वाचकांच्या मनांत भरत नाही त्यामुळे त्यांचें कांही लिखाण कांहीं वाचकांना खर्ड्यासारखें भासतें. पण पंतांचें बहुतेक लिखाण कित्येकांना कित्त्यासारखें भासतें. दोघांच्या भाषेत खळखळ नाही. दोघेहि शब्दांच्या कह्यांत जात नाहीत. तात्यांची भाषा अर्थवती, तर पंतांची अर्थवती असूनहि नादवती. पाठ करण्यासारखे अुतारे पंतवाङमयांत जास्त. तात्यांची शैली वर्तमानपत्री आहे. पंतांची ओघवती लेखनशैली वर्तमानकाळाचे दरवाजे खुले करून, वाचकाला भव्य भविष्याकडे नेते. तात्यांच्या लेखणीचें टोंक अेकसारख्या लेखनाने झिजल्यामुळे गुळगुळीत झालें आहे. पंतांची लेखणी अुसंत मिळतांच स्फूर्तीच्या वालुकापत्रावर घासून अणकुचीदार बनते !</br>
{{gap}}"ॲडिसन आणि स्विफ्ट यांच्या रचनेची धाटणी अनुक्रमे तात्या व पंत यांच्या लिखाणांत दिसून येते. पंतांजवळ स्विफ्टजवळ नसलेली काव्याची देणगी होती. ॲडिसन तात्यांप्रमाणें राजकारणी नव्हता. केळकर ॲडिसन-<noinclude><Br>{{gap}}मा. ज. अु. ४</noinclude>
9hc0y5u0odyvvbjq9jbsg7gxf6plx5r
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६२
104
101768
233013
209790
2026-07-09T16:32:50Z
कल्पनाशक्ती
3813
233013
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[५५}}
{{rule}}</noinclude>निरनिराळ्या विषयांवर बोलत असतां. जणु कांही विषय, व्यक्ति आणि तास यांचा, आपला वेळ केव्हा कोणी किती घ्यावयाचा ह्याबद्दल, आगाअू संकेत ठरूनच, सारे व्यवहार चाललेले असतात !" दुपारची वामकुक्षी आणि रात्रीची झोप यांना वांटून दिलेला मोजका वेळ सोडला, तर बाकीच्या त्यांच्या वेळाचा प्रत्येक क्षण बोलण्यांत, लिहिण्यांत, वाचण्यांत किंवा मनन करण्यांत जात असतो. कोल्हटकर हे आयुष्याकडे अुपभोगाच्या दृष्टीने पाहतात, तर केळकर हे आयुष्याकडे अुपयोगाच्या दृष्टीने पाहतात. आणि या दोघां साहित्याचार्यांच्या या विशिष्ट दृष्टिकोणाचा परिणाम त्यांच्या वाङ्मयावर झालेला स्पष्ट बघावयाला मिळतो. कोल्हटकर यांचें वाङ्मय मुख्यतः रंजनप्रधान, तर केळकरांचें वाङ्मय मुख्यतः ज्ञानप्रधान आहे; व कोल्हटकर यांच्याकडे गेलें असतां मनुष्य जसा आनंदित होअून परत येतो, तसा केळकर यांच्याकडे गेलें असतां तो उद्बोधित होअून परत येतो. कोल्हटकर यांच्या साध्याहि बोलण्यांत जशी कल्पकता व्यक्त झालेली असते, तसा केळकर यांच्या साध्याहि बोलण्यांत त्यांचा बहुश्रुतपणा प्रतिबिंबित झालेला असतो; व त्यामुळे त्यांचे अगदी स्वैर कथालापसुद्धा अुपदेश होअून बसतात.</br>
{{gap}}पण या दोघा मित्रांच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टींत जरी फरक असला, तरी त्यांच्या स्वभावांत मात्र पुष्कळच साम्य आढळतें. "</br>
{{gap}}( वसुंधरा - दिवाळी अंकांत (१९३१) ग. त्र्यं. माडखोलकर).</br>
{{gap}}रा. ग. वि. केतकर, केसरीचे पूर्वी अेक वेळचे व मराठा पत्राचे
विद्यमान संपादक लिहितात ---</br>
{{gap}}" सभाचालकांच्या मनांत हा विश्वास तात्यासाहेब यांनी आपल्या कृतीने अुत्पन्न करून ठेवला आहे. व्याख्यानें अैकून भागलेला व कांटेकोर दृष्टीचा किंवा अेक प्रकारें दुर्ललित बनलेला पुण्याचा सुशिक्षित श्रोतृवृंद हा तात्यासाहेब यांचें अध्यक्षीय भाषण अैकण्यासाठी, अितर कंटाळवाणी भाषणें अैकण्याची अगर समारंभिक क्रिया पाहण्याची शिक्षा भोगीत बसलेला असतो; व तात्यासाहेब अुभे राहिले, म्हणजे ते कांही नवे मार्मिक विचार अुद्बोधक व चटकदार रीतीने मांडतील अशी त्याची खात्री असते.{{nop}}<noinclude></noinclude>
2aa6i8z77sc5ve75jt2cf507j7swjc5
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६३
104
101769
233014
209791
2026-07-09T16:33:42Z
कल्पनाशक्ती
3813
233014
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|५६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}"याला कारण तात्यासाहेब यांची औचित्याकडे असणारी मार्मिक दृष्टि, विषयाचें मर्म, व त्यांतील नेमका महत्त्वाचा भाग विश्लेषण करून काढण्याची भेदक बुद्धि, त्यांना स्वाभाविक सुचणाऱ्या मार्मिक विनोदी अुपमा, अेकान्तिक अगर अेकांडेपणाचा अभाव व व्यापक सहानुतीची मनोभूमिका त्यांचें नित्य नवें चालू असलेलें वाचन, त्यायोगें त्यांना प्राप्त झालेला अष्टपैलूपणा, अित्यादि गुणांचा समुच्चय हेंच होय. तात्यासाहेब हे अुपजत वक्ते नसतांना, किंबहुना वक्तृत्वाला हानिकारक अशा कित्येक स्वाभाविक अडचणी असतांनाहि, त्यांच्या वरील गुणांची सरशी होते.</br>
{{gap}}" जे गुण अध्यक्षाला अुपयोगी पडतात, तेच वाङ्मयांत प्रस्तावना लेखकाला असावे लागतात. '''तात्यासाहेब यांनी प्रस्तावना लिहिली, म्हणजे अेक प्रकारें वाङमयक्षेत्रांत त्या ग्रंथाला " राजमान्यता" प्राप्त होते. या दृष्टीने त्यांना मराठी वाङमयाच्या राजाची अुपमा शोभेल.''' आणि राजाच्या शिक्कामोर्तबाला जी किंमत आहे, तीच त्यांच्या अभिप्रायाला अगर प्रस्तावनेला मराठी वाङ्मयांत प्राप्त झाली आहे. ( 'वैनतेय' पत्रांत ग. वि. केतकर. )</br>
{{gap}}टिळक-केळकर यांची भाषासरणीहि अशीच मनोवेधक आहे. समर्पक दृष्टान्तांनी विषयप्रतिपादन सुलभ करणारे केळकर हे अेकटेच मराठी लेखक होत. मार्मिक कोट्या, सूक्ष्म विनोद, बहारदार वर्णनें, सूचक सुभाषितें व म्हणी, ठसकेबाज व नेमके शब्दप्रयोग, तर्कशुद्ध व पटणारें विषयप्रतिपादन, आणि पुनः समतोलपणाच्या तारेवरील कसरत, ह्रीं सर्व अेका वेळी व अेका ठिकाणीं पाहावयाचीं असल्यास केळकर यांचा अेखादा सुंदरसा अग्रलेख वाचावा म्हणजे झालें ! टीकेचाहि तोच प्रकार. चिपळूणकर काय, टिळक काय, आगरकर काय, किंवा परांजपे काय, या सर्वांचाच प्रतिपक्षावर 'ब्रह्मास्त्र' सोडण्याचा प्रघात, पण केळकर यांचा नेहमीचा प्रघात म्हणजे शत्रूवर टीकेचें 'मोहनास्त्र' सोडण्याचा ! यामुळे होतें काय की, प्रतिपक्षाला परांजपे यांची 'व्याजोक्ति', किंवा टिळक-आगरकरांची 'अेक घाव की दोन तुकडे' करण्याची पद्धति पुरवते; पण केळकर यांचे हे ' रेशमी चिमटे' आणि 'शालजोडींतले' कांही सोसवत नाहीत ! याचींहि अुदाहरणें 'केळकरकृत लेखसंग्रहां'त पुष्कळ सापडतील.{{nop}}<noinclude></noinclude>
bm9r4clqh1kulscdbahovr7nff1617j
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७२
104
102109
233015
209800
2026-07-09T16:35:08Z
कल्पनाशक्ती
3813
233015
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[६५}}
{{rule}}</noinclude>लेखनकला कोणालाहि हस्तगत करतां येअील. कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजांतील आमचे प्रोफेसर शिवराम बापूजी परांजपे यांचें अेक वाक्य मला आठवतें. तें असें की, " बेट्या, Have something to say and it is easily said.” आणि त्याचबरोबर अमेरिकन तत्त्ववेत्ता अिमर्सन यांचें अेक वाक्य मला आठवतें. तें असें की, " A river always makes its own bed. " हीं दोनहि वाक्यें अेकत्र घेतली तर त्यांचा अर्थ असा की, मनांत मतप्रतिपादनाची हौस असली म्हणजे ती शमविण्याकरिता कल्पना सुचूं लागतात, त्या पुष्कळशा मनांत सांठल्या म्हणजे शब्दांच्या द्वारें त्या आपला मार्ग काढतात, व आपल्या प्रवाहाला अनुकूल किंवा पुरेसें पात्र आपल्या सामर्थ्याने निर्माण करतात. नाही म्हणावयाला अुलट बाजूचींहि कांही अुदाहरणें मला माहीत आहेत. म्हणजे मतप्रतिपादन व वादविवाद हें जणू काय त्यांना व्यसनच जडून राहिलेलें असतें. त्या कामीं ते बोलबोलून भांडभांडून आपला जीव घाबरा करतील आणि दुसन्याला कंटाळा आणून त्याचाहि जीव नकोसा करतील. पण लिहिण्याची गोष्ट निघाली की त्यांची गति खुंटली ! अेका पोस्टकार्डाअितकाहि मजकूर त्यांच्या हातून लिहून व्हावयाचा नाही. पण हीं उदाहरणें मी अपवादासारखी मानतों. मला संमत असा नियम म्हटला म्हणजे वरील दोन अिंग्रजी वाक्यांत ग्रथित झालेला.</br>
{{gap}}(५१) दुर्दैवाने पुष्कळ लोकांच्या समजुतींत ही गोष्ट येत नाही की, वंशवृद्धीशिवाय ज्याप्रमाणें समाज वाढणार नाही, त्याप्रमाणे मतप्रसाराशिवाय समाजाची प्रगति किंवा अुन्नति होणार नाही. कांही लोकांना असें वाटतें की " आमची मतें तीं काय, त्यांना किंमत कसली ?" दुसऱ्या कांहीना असें वाटतें की " आम्हांला काय लिहितां येणार ?" पण पहिल्या प्रकारचें मत चुकीचें व दुसरें मत भ्रमात्मक आहे. लोकोपयोगी अशा विषयावरील प्रत्येक व्यक्तीचें मत निश्चित ठरणें, व तें त्याने प्रकट करणें, याविषयी समाजाचा व्यक्तीवर हक्क आहे. प्रत्येक व्यक्तीच्या संग्रहीं असलेला पैसा मिळूनच जशी राष्ट्रीय संपत्ति गणतात, त्याचप्रमाणें समाजांतील व्यक्तींचीं मतें अेकत्र धरूनच राष्ट्राची विचारसंपत्ति गणली<noinclude></br>{{gap}}मा. ज. अु. ५</noinclude>
k3wu73crjhghdjxbpnblj6acw4t7dz1
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७७
104
102148
233006
209805
2026-07-09T16:17:08Z
कल्पनाशक्ती
3813
233006
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|७० ]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>चांगलें लिहितां येत नसलें तरी माणसाला अेखादी कवितेची ओळ. जुळवावीशी वाटतेच. आपणाला तें गम्य नाही, ती कला साध्य नाही, हें तो विसरतो.</br>
{{Block center|<poem>None dares be pilot
{{gap}}{{gap}}who never steered a craft
No untrained nurse
{{gap}}{{gap}}administers a draught
None but skilled workmen
{{gap}}{{gap}}handle workmen's tools
But verses all men scribble,
{{gap}}{{gap}}wise or fools.
{{right|-Horace}}</poem>}}
{{Block center|<poem>But those who cannot write
{{gap}}{{gap}}and those who can
All rhyme and scrawl
{{gap}}{{gap}}and scribble to a man.
{{right|-- Pope}}</poem>}}
{{gap}}कवि टेनिसनच्या दोन ओळी अशा आहेत --
{{Block center|<poem>In the spring a young man's fancy
Lightly turns to thought of love.</poem>}}
हें खरें आहे. पण love या शब्दाच्या जोडीला verse हाहि शब्द घालतां येअील असें मला वाटतें. अेखाद्या साहित्यिकांत कवि होण्याची पात्रता असते. कारण त्याची प्रतिभा अुज्ज्वल असल्याचें स्पष्ट दिसतें. पण अुत्कृष्ट काव्य त्याच्या हातून निर्माण होत नाही. 'A great poet who has not written a great poem' असें वर्णन अेका जर्मन साहित्यिका- बद्दल माझ्या वाचण्यांत आलें आहे. ' We presume capabilities; we do not find accomplishments'. विज्ञानशास्त्रांत निष्णात असलेले कित्येक लोक प्रतिभासंपन्न असतात. पण त्यांच्या भाषेला काव्याचें वळण<noinclude></noinclude>
b7er2mnnn9os7ug55ujdteq084nf21q
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०१
104
102357
233007
209829
2026-07-09T16:18:13Z
कल्पनाशक्ती
3813
233007
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|९४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>पुस्तकांत नाही ती सोयीचीच आहे. केवळ वाङ्मय म्हणून लोक नाटकें वाचावयाला शिकले तर तें हवें आहे. शिवाय नाटक व कादंबरी यांतलें अंतर होअील तितकें काढून टाकावें, अशी अेक माझी कल्पना आहे. तिचाहि त्यांतल्या त्यांत प्रयोग होअूं शकेल.</br>
{{gap}}(८३) त्याचा प्रकार असा. कादंबऱ्यांच्या जुन्या पद्धतींत आता फरक करण्याची वेळ आली आहे. तो फरक हा की, वर्णनें किंवा ग्रंथकर्त्याचें पाल्हाळिक विवेचन यांना रजा द्यावी, आणि बहुतेक सर्व कादंबरी संभाषणात्मक असावी. रा. हरिभाऊ आपट्यांच्या कादंबऱ्या पहिल्या प्रकारच्या असून या प्रकारामुळेच मधून मधून त्या कंटाळवाण्या होतात. अुलट अलेक्झांडर ड्यूमा या फ्रेंच कादंबरीकाराचीं पुस्तकें घेतलीं तर, शेंकडा पंचाण्णव अितका त्यांतला भाग संभाषणात्मक असतो म्हणून तीं चटकदार वाटतात. ड्यूमाच्या कादंबन्याहि कंटाळवाण्या होतात. पण त्याचीं कारणें वेगळीं होत. तीं अशीं की, त्या फार मोठ्या, कथासूत्र चांगलेंसें संभाळले जात नाही, प्रवेश अुडते व असंबद्ध फार, आणि कांही कांही प्रसंग ठरीव कायम ठशांचे. पण ड्यूमाची संभाषणात्मक पद्धति अनुसरून सुमारें अडीचशें पानांची कादंबरी, मधून मधून अगदी अवश्य तितकींच लहान वर्णनें किंवा विचार घालून लिहिलीं असतां, ती या दिवसांत वाचकांना आवडेल. आणि त्यांतच हेंहि साधेल की, निरनिराळी प्रकरणें हेच जसे कांही नाटकांतील प्रवेश होतील, व मधलीं वर्णनें व विचार काढून टाकून दिले, किंवा तेच कोणा पात्रांच्या तोंडीं बसविले की, थोड्या सांधजोडीच्या प्रयत्नाने कादंबरींतून नाटक तयार होअील. कादंबरींतील वर्णनें व आत्मविश्लेषणादि चर्चा हीं नाटकांतील आत्मगत भाषणाप्रमाणे कंटाळवाणीं होतात. म्हणून तीं दोनहि निघून गेल्यास कादंबरी व नाटक हीं पुष्कळांशीं अेकरूप होअून, किंचित् प्रयत्नाने त्यांचें अेकमेकांत रूपांतर होअूं शकेल अशी माझी कल्पना आहे. आणि तसे झाल्याने नाटकांच्या प्रकारांत वाङ्मयाला जें पारतंत्र्य आज आलेलें आहे तें जाअून, कादंबन्यांच्या प्रकारांतलें स्वातंत्र्य येअील. असली कादंबरी छापली तरी ती म्हणजे हटकून विकली जाअून खपेल असें नाही. कारण हें निवळ तंत्र झालें. पण नाटकापेक्षा अधिक पुढे येअून वाचकांच्या हातीं जाण्याला तिला अधिक वाव मिळेल.{{nop}}<noinclude></noinclude>
d0lm3mzzqm48jqnpu52cesidjo4g1r4
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०७
104
102422
233008
209835
2026-07-09T16:19:12Z
कल्पनाशक्ती
3813
233008
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१००]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>पोलिसाच्या चातुर्यविषयक कादंबरीचें रूप शेवटीं आलें असलें, तरी मुख्य अुद्देश केवळ तत्त्वचिकित्सक कसा आहे, हेंं मीं त्या कादंबरीच्या शेवटीं सविस्तर विवेचन करून सांगितलें असल्याने येथे सांगत नाही. ही कादंबरी देखील माझ्या आवडीप्रमाणें वहुतेक सर्व संभाषणात्मक आहे. यांतील कोणतेंहि पात्र म्हणण्यासारखें चांगलें रंगलेलें नाही. पण सगळ्यांचा संच एकत्र घेतला असतां, तो कादंबरीच्या मुख्य हेतूला पोषक असा झाला आहे. या कादंबरींत दोनच प्रणयप्रसंग आहेत. पैकी एक संभाविती विलायती थाटाचा, व दुसरा आपल्या देशी आधुनिक अभिरुचीचा असा आहे. माझ्या सर्व नाटक-कादंबऱ्यांत दोनच प्रवेश-प्रसंग अुत्तान किंवा फाजील प्रणयाचे आहेत. पैकीं अेक तोतयाच्या बंडांतील वगंभट व विठाई यांचा, आणि दुसरा 'कावळा व ढापी' यांतील जंबू व बिंबा यांचा. ही कादंबरी खरी वास्तववादी म्हणतां येईल. कारण तीव्र बुद्धीचे सुशिक्षित लोकहि प्रसंगविशेषीं बुद्धिप्रामाण्य विसरून अतर्कित बाह्यशक्तिदर्शनाने भांबावून गेल्याची अुदाहरणें हल्लीच्याहि काळांत माझ्याप्रमाणें अितर अनेकांनी पाहिलीं असतील !</br>
{{gap}}माझी चवथी कादंबरी 'कोंकणचा पोर' ही कादंबरी वॉल्टर स्कॉट्च्या 'विंवटिन डरवार्ड' या कादंबरीच्या स्वरूपाची आहे. तिचा हेतु सर्वस्वीं अितिहास-दर्शनाचा असून पार्श्वभूमि सर्वस्वीं प्रादेशिक कोंकणी आहे. माझे फारच थोडे दिवस कोंकणांत गेले आहेत, तथापि कोंकणांतील जीवन मला फार प्रिय वाटतें. म्हणून तें प्रादेशिक जीवन शक्य तितकें यथार्थ रंगविण्याचा प्रयत्न मी केला आहे. ' मराठे व अिंग्रज' या माझ्या अतिहास-ग्रंथाची पुरवणी ' कोंकणचा पोर' ही कादंबरी ठरते, व तशीच ती योजलेली आहे. या कादंबरींत कोणतेंच पात्र हातीं घेअून त्याचा स्वभाव मला पद्धतशीर रंगवितां आलेला नाही. अेकच अेक स्त्रीपात्र घातलें आहे. तें अगदीं नांवाला म्हटलें तरी चालेल. यामुळे अितिहासाची आठवण किंवा त्याचें प्रेम नसलेला मनुष्य ही कादंबरी वाचील, तर तो तिजवर अगदी नाराज होल यांत शंका नाही. अलीकडच्या जॉर्जेट पातळवजा कादंबऱ्या वाचणाराला माझी ही कादंबरी म्हणजे जुन्या काळचा बुरणूस वाटेल ! पण कादंबरीची माझी कल्पना हल्लीच्या प्रथित यश कादंबरीकारांच्यापेक्षा वेगळी आणि अधिक विस्तृत आहे अितकेंच मी म्हणतों.{{nop}}<noinclude></noinclude>
jm5xphjwdghsksxolo95v4jg0dn7oe7
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१०८
104
102423
233009
209836
2026-07-09T16:20:08Z
कल्पनाशक्ती
3813
233009
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१०१}}
{{rule}}</noinclude>{{gap}}माझ्या कादंबऱ्या व नाटकें या दोहोंसंबंधाने दोन सर्वसामान्य विधानें. करतां येतील. अेक असें की, मला अस्सल दुष्ट मनुष्य म्हणजे काव्यनाटकांतला खलनायक (व्हिलन ) मुळीच रंगवितां आला नाही. याचा अर्थ, अितर कोणा ग्रंथकारांनी ते चांगले रंगविले म्हणून ते माझ्याहून अधिक दुष्ट बुद्धीचे आहेत असा नाही. तर माझ्या कल्पनाशक्तीचा पल्लेदारपणा कमी अितकाच त्याचा अर्थ. दुसरें असें की, माझ्या कादंबऱ्या-नाटकें यांतील पुरुषपात्रांपेक्षा स्त्री-पात्रें अधिक चांगलीं रंगविलीं गेलीं आहेत. अुदाहरणार्थ, पार्वतीबाअी, अमला, तारिणी, विमल, नीला अशीं पात्रें निर्माण करतां आल्याचा मला अभिमान वाटतो.</br>
{{gap}}(८९) आता मराठीशिवाय मला समजतात अशा कांही अितर भाषांविषयी थोडें सांगतों. भाषाविषय व वाङ्मय यांच्या स्वाभाविक गोडीमुळे मी अिंग्रजी वाङमय पुष्कळच वाचलें. परंतु त्या मानाने संस्कृत फारच थोडें वाचलें. संस्कृताशिवाय अितर कोणतीहि भाषा शिकलों नाही याचें मला वाअीट वाटतें. ज्याला सामान्यतः भाषाविषयाची गोडी असते आणि ज्याला वाङ्मयात्मक लेखनाची हातोटी साधलेली असते, त्याल परभाषा शिकणें फारसे अवघड जात नाही असें म्हणतात. या दृष्टीने पाहतां मी परभाषांपैकी निदान फ्रेंच, व देशी भाषांपैकी कानडी, गुजराती, हिंदी, बंगाली अितक्या भाषा थोड्याशा प्रयत्नाने शिकूं शकलों असतों. पण तें माझ्या हातून घडलें नाही. देश-भाषांपैकी बंगाली मी अेकवेळ शिकलों होतों. पूर्ववयांत मी अेका बंगाली पुस्तकाचें भाषांतर छापून प्रसिद्ध केलें. दुसऱ्या अेकाचें निमेंशिमें करून ठेवलें पण छापलें नाही. मला हिंदी चांगलें कळतें. हिंदी भाषेंतील लेख व्याख्यान अैकलें असतां त्यांतील शेंकडा नव्वदपंचाण्णव अितका भाग मला समजतो. परंतु हिंदी व्याकरणाचा अभ्यास केलेला नाही, व अस्सल हिंदी शब्दभांडारहि अगदीच बेताबाताचें. यामुळे मला हिंदी चांगलें लिहिण्याअितकें येत नाही. पण कोणीहि माझ्या बरोबरीचा हिंदी गृहस्थ जितकें मराठी लिहील त्यापेक्षा मी हिंदी अधिक चांगलें लिहूं शकेन असा मला विश्वास वाटतो. आणि याचा अेकदा सहज अनुभवहि आला.{{nop}}<noinclude></noinclude>
rr09uipcc84eksdgludq9e99bubtcz9
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११०
104
102596
233017
209838
2026-07-09T16:40:32Z
कल्पनाशक्ती
3813
233017
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१०३}}
{{rule}}</noinclude>वगैरे महाराष्ट्रीय लोक हिंदी भाषा लिहिण्यांत अितके निष्णात आहेत की त्यांचा हात हिंदी लेखकहि धरणार नाहींत. पण हिंदी मातृभाषा असणारे पण चांगले मराठी लेखक किती झाले ? माझें गुजरातीचें ज्ञान हिंदीपेक्षाहि पुष्कळच कमी आहे. ती भाषाच महाराष्ट्रांत हिंदीपेक्षा कमी प्रसृत आहे. यामुळे महाराष्ट्रियांना हिंदीपेक्षा गुजराती कमी येतें. बडोदें प्रांत गुजरात वगैरेमध्ये राहाणाऱ्या महाराष्ट्रियांची गोष्ट मात्र वेगळी. तेथे काका कालेलकरांसारख्या गृहस्थांनी गुजराती लेखक म्हणून जसें नांव केलें तसें कोणत्याहि गुजराती मनुष्याने मराठी लेखक म्हणून नांव केलेलें नाही. कानडी मात्र मला दहापांच वाक्यांअितकेहि येत नाही. याचें कारण कानडी कानावरून जात नाही असें नाही; तर ती भाषाच अवघड व संस्कृतापासून अगदी सुटून आहे. अुलट अुच्च प्रतीचें हिंदी, गुजराती, बंगाली घेतलें तर त्यांतले साठ पाअुणशें टक्के शब्द जवळ जवळ सारखे म्हणजे संस्कृताशीं संबंध असलेले, असेच आढळतील.</br>
{{gap}}(९२) मला संस्कृत भाषेची व वाङमयाची फार आवड आहे. 'संस्कृत विद्येचें पुनरुज्जीवन' या माझ्या निबंधांत ती चांगलीच दिसून येते. हायस्कुलांत असतां मी अमरकोश ( कांड १) पाठ केला होता. त्याचप्रमाणें रूपावली व समासचक्र घोकलें होतें. रघुवंशाचे दोनतीन सर्ग वाचले होते. डॉ. भांडारकर यांच्या संस्कृत शालोपयोगी पुस्तकांपलीकडे व्याकरणांत माझी मजल गेली नव्हती. पण आपटे यांच्या ग्रंथांतील अुतारे सुभाषित-संग्रह अित्यादिकांचें वाचन माझें मधून मधून होत असे. तथापि संस्कृत भाषेचा पद्धतशीर अभ्यास असा नाहीच म्हटलें तरी चालेल. कॉलेज सोडल्यानंतर मी संस्कृताचा ग्रंथ क्वचितच वाचला असेल. नाही म्हणावयाला, केवळ विनोदस्थळें हुडकून तीं 'सुभाषित व विनोद' या विषयावरील पूर्वींच्या ग्रंथांत अुदाहरणादाखल घालण्याकरिता, मी अनेक संस्कृत काव्य-नाटकें चाळलीं. पण तेव्हाहि त्याचा अभ्यास असा केला नाही. मग स्वतः संस्कृत लेख मी कोठून लिहिणार? आणि त्यांना संधि तरी कोठें होती ? तथापि संधि येतांच माझी संस्कृताची आवड जागृत होअी. त्याप्रमाणें प्रथम १९०६ सालीं, किर्लोस्कर नाटक गृहावर अखादें अुचित वचन पाहिजे होतें म्हणून मी खालील श्लोक मुद्दाम तयार करून दिला -{{nop}}<noinclude></noinclude>
qv43u5gilaxn0hsq4zw4crl8hko0izx
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१११
104
102597
233016
209839
2026-07-09T16:40:09Z
कल्पनाशक्ती
3813
233016
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१०४]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{Block center|<poem>'''प्रज्ञा विघृष्ट प्रतिभा- मणिदीपप्रकाशितं'''
'''संसारालेख्यभांडारं पश्येदं रंगमंदिरम्''''</poem>}}
{{gap}}नाटकगृहाच्या या वर्णनांत थोडक्यांत सर्व कांही त्याविषयीचें मर्म आलें आहे.</br>
{{gap}}(९३) यानंतर ता. २० जुलै १९२० रोजीं वासुदेवशास्त्री खरे यांच्या अध्यक्षतेखाली ' अितिहास व अितिहाससंशोधन' या विषयावर भा. अि. सं. मं. च्या विद्यमानें माझें व्याख्यान व्हावयाचें रलें. तेव्हा त्या प्रसंगाकरिता मी, सुभाषितपद्धति डोळयांपुढे ठेवून, अितिहाससंशोधक-वर्णनपर असे खालील संस्कृत श्लोक केले--</br>
{{Block center|<poem>'''"अद्ध्वस्तवर्णरुचिचित्रकलापहर्म्यः '''
{{gap}}'''विच्छिन्नलेखनपुराणशिलासनस्थः ।'''
'''दुष्कीटभुक्तशतपत्र पटोत्तरीयः'''
{{gap}}'''निर्मूल्यनाणकगणैः परिपूर्णकोशः ॥ १ ॥'''
'''नष्टाधिकारपरिहासितगर्वमुद्रः'''
{{gap}}'''संदेहवृत्तिवशवृंहणयंत्रदृष्टिः'''
'''श्रद्धावितर्कपरिचारकवेष्टितांगः'''
{{gap}}'''संशोधकः खलु प्रशास्ति विशून्यराज्यम् " ॥ २ ॥'''</poem>}}
{{gap}}मला वाटतें, हे श्लोक अितके मार्मिक अर्थपूर्ण असे साधले आहेत की त्या कृतीचा मला खरोखर अभिमान वाटतो. आणि ' असे श्लोक या विषयावर तुम्ही करा पाहूं ' असें आव्हान मी थट्टेने, माझ्या बरोबरीच्या संस्कृतज्ञांना, (म्हणजे माझ्याइतकाच संस्कृताशीं अल्प परिचय असणाऱ्या अज्ञांना !) देअूं शकेन. खरेशास्त्री यांना हे श्लोक फारच आवडल्याचें त्यांनी मला सांगितलें. कारण त्यांत जुन्या सुभाषितांची खोटी अैट चांगली साधली आहे! !</br>
{{gap}}(९४) यानंतर मी सिमल्यास कायदेमंडळाच्या कामावर असतां, कृष्णशास्त्री कवडे यांनी आपलें 'क्लोमनिर्णय' नांवाचें लहानसें स्वकृत संस्कृत<noinclude></noinclude>
hifjquggt7qdznwrnhxriqe7ny3fwo7
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११२
104
102598
233018
209840
2026-07-09T16:42:02Z
कल्पनाशक्ती
3813
233018
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१०५}}
{{rule}}</noinclude>पुस्तक मजकडे पाठविलें. तेव्हा संस्कृत लिहिण्याची हुक्की पुनः येअून, मी खालील अभिप्राय संस्कृतांतच लिहून त्यांजकडे पाठविला :--</br>
{{gap}}"परमसुहृद्भ्यो वैद्यपंचाननकृष्णशास्त्रिभ्योऽहं नृसिंहशर्मा स्नेह-प्रमाणपूर्वकं निवेदयामि ।</br>
{{gap}}"यत् अद्यतिथितावत् अत्र सर्वमपि कुशलं श्रीधन्वंतरिकृपया । हिमालयकुक्षिस्य-हिंद-विधि-महामंडलस्य कार्यं यथाकथं निर्वाह्य अहं झटित्येवात्रागतः पंचदिनात्पूर्वम् । तदुपरि मित्रकार्ये कालक्षेपमसहमानेन मया भवद्भिरुपायनीकृतं ' क्लोमनिर्णय ' पुस्तकं परिशीलनार्थमुद्धृतम् । वाचनक्रमे च तत्र मया पूर्वापेक्षितमेवानुभवितं । यत् आदौ तावत् वैद्यक-विषयः स्वतः अेव गहनः सन् परिभाषाकाठिण्येन गहनतरः संजातः । परं च प्रस्तुत निबंधकारस्वीकृतविद्वत्परिपाठ्यनुसारिण्याऽभिरुच्या गहनविषय-गंडस्योपरि पीटिका संवृत्ता । अेवंहि मया निबंधकलितविवादविषये प्रवेशार्थं यथामति प्रयत्नः कृतः । संतोषो भवति च निवेदनाय यत् कठिनं सदपिकार्यंं भवद्भिः सुतरामेव सम्यक्तया निर्वाहितं ।</br>
{{gap}}"शारीरपरिभावानिश्चयाद्विना शारीराङ्गोपाङ्गानां वर्णनं क्लेशकलितं भवेत् " अित्येत्तद्यद्भवद्भिरुक्तं तदस्माकं संमतार्थमेव । प्राचीनाचार्यैः शारीरशिक्षणविषये यथार्थचित्रदर्शनं सर्वथोपेक्षितम् । अत अेवार्थनिश्चये काठिन्यं समुत्पन्नम् । अधुना तु आयुर्वेदशिक्षकस्तत्वविवेचक-निबंधकारैरपि अेतदावश्यकशिक्षणसाधनं नोपेक्षितं भवति अित्येतदत्यंतमभिनंदनास्प मन्ये ।</br>
{{gap}}"भवन्तु नाम देवाः परोक्षप्रियाः । मानुषैस्तु अेतद्देवचरितं नानुकरणीयम् । लौकिकविषये अपरोक्षानुभूतिरेव जिज्ञासूनां शरणं भवति ।अित्यलं । "</br>
{{gap}}(९५) यानंतर पुण्यांतील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या अेका वार्षिक सभेचें अध्यक्षस्थान मला देण्यांत आलें. तेव्हा तर संस्कृत गद्यलेखनाला अेक प्रकारें मित्रकृत आव्हान असेंच वाटलें. म्हणून मोठी मेहनत घेअून माझें सर्व अध्यक्षीय भाषण मी संस्कृतांत लिहून काढलें. तें वाचण्यास अर्धा-पाऊण तास लागण्याअितकें विस्तृत तर आहेच; पण भाषा आणि<noinclude></noinclude>
hb61qfm0wq24gr78l1fveiu14suhfek
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११३
104
102599
233019
209841
2026-07-09T16:43:24Z
कल्पनाशक्ती
3813
233019
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१०६]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>विवेचनपद्धति दोनहि दृष्टींनी तें फार चांगलें वठलें आहे असें कांही संस्कृतज्ञ मित्रांनी ( अुदाहरणार्थ वामनशास्त्री किंजवडेकरादि ) मला खऱ्या भावाने सांगितलें. या भाषणांत, संस्कृत वाङ्मय हें, व्याकरण व संधिनिर्बंध यांच्यामुळे, निष्कारण कठिण व गूढ कां वाटतें, आणि तें सोपें सुलभ कसें करतां येअील, याची चर्चा मीं केली आहे. या कारणाने, मराठींतील नष्कारण अनुस्वारांविरुद्ध झालेल्या चळवळीचा जसा मीं आधुनिक जनक ठरतों, तसाच संस्कृतांतील निष्कारण संधीविरुद्ध चळवळीचाहि ठरलों आहें. आणि या दोनहि चळवळींना थोडेबहुत यश आलें आहे व पुढे आणखीहि येअील.</br>
{{gap}}(९६) १९३५ साली मीं 'सह्याद्रि' मासिक सुरू केलें. त्याच्या माथ्यावर सह्याद्रिविषयक अेखादा अवतरणरूप संस्कृत श्लोक घालण्याची आवश्यकता भासली. तेव्हा तो श्लोक मीच खालीलप्रमाणे तयार केला --</br>
{{Block center|<poem>'''श्रीरामदासशिवगणचरणांजितधूलिधूसरितमौलिः ।'''
'''निश्चलवृतिररिसागरभङगश्रीर्जयति जगति सह्याद्रिः ॥'''</poem>}}
{{gap}}हा श्लोक पूर्णपणें श्लेषात्मक आहे हें वाचकांच्या लक्षांत येअीलच.</br>
{{gap}}(९७) यानंतर बेळगांव व पुणें येथील संस्कृत साहित्य-संमेलनांत संस्कृत लेख लिहून वाचले. मला संस्कृत बोलतां येत नाही, प्रयत्नाने लिहितां येतें. तथापि संस्कृत भाषेंतील या माझ्या अुपद्वयापावरून अेखाद्या अपरिचित मनुष्याची कल्पना माझ्या संस्कृत-ज्ञानाविषयी होअील ती मात्र खरी ठरणार नाही. माझें हें ज्ञान अगदीच तुटपुंजें आहे. आणि थोड्या भांडवलावर मोठ्या व्यापाराचा देखावा अुत्पन्न करणारा असें माझें मीच जें वर्णन थट्टेनें केव्हा केव्हा करतों तें या संस्कृत ज्ञानासंबंधाने खरेंच आहे.</br>
{{gap}}(९८) यापूर्वी असाच आणखी अेक प्रसंग अगदी अनपेक्षित रीतीने आला. तो असा-सौ. क्षमाबाओ राव ( डॉ. राव यांच्या पत्नी व कै. शंकर पांडुरंग पंडित यांच्या कन्या) या सुविद्य असून, त्यांना अिंग्रजी, फ्रेंच अित्यादि भाषा येतात. पण संस्कृत भाषेवरील त्यांचें प्रभुत्व व तिची<noinclude></noinclude>
0qxiw0ixs9mqevgzligmkc5tpyaa4vn
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२०
104
102794
233020
209848
2026-07-09T16:44:42Z
कल्पनाशक्ती
3813
233020
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[११३}}
{{rule}}</noinclude>वाटण्याचा मनुष्यस्वभाव असतो की नाही ? वास्तविक कोणाहि सुज्ञ ग्रंथकाराला तसें वाअीट वाटण्याचें कारण नाही. कारण तुम्ही अगदी मोठे लोकप्रिय ग्रंथकार झालां, तरी तुमचीं सर्व पुस्तकें सर्व मराठी वाचक वाचतील, वाचूं शकतील, अशी अपेक्षा तुम्ही कां करावी ? पुस्तकें विकलीं जातात, किंवा देणगीरूपाने दिली जातात, त्या प्रत्येकागणिक सुमारे दहा-वीस वाचक त्यांना लाभलें तरी पुष्कळ झाले ! स्वतः तुम्ही ग्रंथकार असलां तर आपल्या ठिकाणीं विचार करून पाहा की तुम्ही तरी लोकांचीं पुस्तकें कितीशीं वाचतां ?</br>
{{gap}}(१०५) मला माझ्या म्हातारपणांत वाङ्मयलेखन हें व्यसनासारखें जडलें आहे असें कोणी म्हटलें ( आणि मी स्वतःहि तें थोडेंसें कबूल केलेंच आहे ) तर त्याचें मला वाअीट वाटणार नाही. पण अिच्छा दोनच. या व्यसनाच्या भरांत माझ्या हातून कदाचित् कांही नीरसहि वाङमय लिहून होवो; पण आजकाल ललिताचा आत्मा होअून बसलेलें अश्लील अभद्र असें वाङ्मय - समाजाला अितरहि रीतीने अपायकारक असें वाङ्मय - लिहिलें न जावें. असलें वाङमय मीं यापूर्वी सहसा कधी जाणून लिहिलें असें स्मरत नाही. आता मनुष्य हा चुकीला पात्र असल्यामुळे, नियमाला अपवाद किंवा गोऱ्या अंगावर तीळ, या न्यायाने अेखाददुसरें अुदाहरण कोणी कोठे कोठे दाखवूं शकेल. परंतु माझ्या चवदा-पंधरा हजार पृष्ठांच्या वाङ्मयांतील अभद्र अश्लील लिखाण काढून दाखवावयाचें झालें तर त्याकरिता अेखादें संशोधक कमिशनच बसवावें लागेल ! दुसरी अिच्छा ही की, पूर्वी कांही वृद्ध साहित्यिकांवर प्रसंग आल्याप्रमाणें, आपलीं पुस्तकें खाकेंत मारून लोकांच्या घरोघर जाअून तीं विक्रीचीं म्हणून त्यांच्या पदरांत बांधण्याची वेळ न यावी. माझी बुद्धि निरोगी राहील तोंपर्यंत माझी पहिली अिच्छा बहुधा सफळ होत राहील. मृत्यूपर्यंत बुद्धि निर्विकार राहणें हें अीश्वराचें देणे. आणि वार्धक्याच्या आपत्तीबरोबर बुद्धीच्या वैकल्याची आपत्ति ओढवणें यापेक्षा मरण बरें. पण या गोष्टी कोणाच्या हातच्या नसतात ! त्याविषयी आपली अिच्छा प्रकट करणें अितकेंच माणसाच्या स्वाधीन असतें, म्हणून तितकेंच मी या ठिकाणीं करीत आहें.{{nop}}<noinclude><br>{{gap}}मा. ज. अु. ८</noinclude>
f7sebpiat3jpsy8bxn0ihg4rdwzjab7
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२५
104
102842
233021
209853
2026-07-09T16:46:13Z
कल्पनाशक्ती
3813
233021
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|११८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>टिळकचरित्राचे तीन खंड हे कर्तव्यबुद्धीने लिहिले गेले. मराठे व अिंग्रज हा ग्रंथ पेशवाअीचें शतसांवत्सरिक श्राद्ध व प्रसंगोपात्त म्हणून अितिहासविषयाच्या प्रेमाने लिहिला. मी अितिहाससंशोधक नाही. पण अतिहास हा माझा अेक अत्यंत आवडीचा विषय आहे व अितिहासाच्या तत्त्वज्ञानांत मला थोडी गती आहे. हास्यविनोद-मीमांसा हा केवळ आवडीचा विषय म्हणून लिहिला. नाटकें कांही नाट्यप्रियतेमुळे व कांही द्रव्यप्राप्तीकरिता लिहिलीं. कादंबऱ्या व लघुलेख ( लघुकथा, लघुनिबंध, वक्रोक्ति लेख, विनोदी चुटके) हे सर्व कलाविलासाच्या हौसेमुळे लिहिले, आणि भारतीय तत्त्वज्ञान हा ग्रंथ केवळ स्वतः विषयाभ्यास करावा म्हणून, आणि त्याचबरोबर निवळ मराठी वाचकांना अुपयोगी पडावा म्हणून लिहिला. तात्पर्य, 'केवळ संशोधनात्मक ' हा प्रकार दिला असतां, बहुश्रुत माणसाच्या दृष्टींत येणारा असा कोणताहि प्रकार मी सोडला नाही. मात्र यांत माझ्या बुद्धिमत्तेपेक्षा आवड व अभिरुचि यांच्या दुर्दमतेला अधिक श्रेय मी देतों. माझ्या समकालीन पिढींत माझ्यापेक्षा अधिक बुद्धिवान असे जितके लोक आहेत की, त्यांच्यापुढे मी ठेंगणाच होअीन. पण दुर्दैवाने त्यांना ग्रंथ कर्तृत्वाची आवडच नाही त्याला कोण काय करणार ?</br>
{{gap}}(११२) अशा रीतीने मी हें आत्मपर विवेचन किंवा समालोचन संपवितों. आणि शेवटी अेका अिग्रज कवीच्या शब्दांनी असें म्हणतों-</br>
{{gap}}{{gap}}Farewell dear flowers</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}Sweetly your time you spent</br>
{{gap}}{{gap}}Fit while you lived</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}For smell or ornament</br>
{{gap}}{{gap}}And after death for cures</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}I follow straight</br>
{{gap}}{{gap}}Without complaints or grief</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}Since if my scent be good</br>
{{gap}}{{gap}}I care not if</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}It be as short as yours.{{nop}}<noinclude></noinclude>
72q9diaipkchy3y2e9kpt4ag3t20p3i
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३०
104
102937
233022
209864
2026-07-09T16:47:19Z
कल्पनाशक्ती
3813
233022
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१२३}}
{{rule}}</noinclude>त्याने आपणाला (ऑगस्टसला ) अर्पण केली नव्हती याचें बादशहाला वाअीट वाटे. आणि ज्या अितर कोणा स्नेह्यांना त्या अर्पण केल्या जात त्याविषयी त्याला मत्सरहि वाटे. म्हणून एकदा त्याने होरेसला लिहिलें--</br>
'हे पाहा, प्रिय मित्रा, मला आज तुझ्याकडून ज्या प्रकारच्या तूं केलेल्या कविता वाचण्याकरिता म्हणून आल्या त्यासारख्या कविता तूं स्वतः मला कधीच अर्पण करीत नाहीस. म्हणून मी तुझ्यावर फार रागवलों आहें ! त्या सगळ्या तुझ्या अितर मित्रांनाच लाभतात. कायरे, तुला अशी भीति वाटते की काय ? की तूं अेखादी कविता मला अर्पण केलीस तर तूं राजमित्र होतास ही गोष्ट पुढच्या पिढ्यांना अुमगून येअून त्यामुळें तुझी अब्रू कमी होईल ?” होरेसने बादशहाला या पत्राचें अुत्तर कविता रूपानें पाठविलें, त्यांत या नाजुक स्तुतीच्या व मोठेपणाच्या अहेराला तसाच नाजुक परत अहेर केला. तो लिहितो --</br>
{{gap}}Since you, great Caeser, singly wield the charge</br>
{{gap}}Of Rome's concerns, so manifold and large</br>
{{gap}}With Sword and Shield the commonwealth protect</br>
{{gap}}With moral grace it, and with laws correct</br>
{{gap}}The bard, methinks, would do a public wrong</br>
{{gap}}Who, having gained your ear, should keep it long-</br>
{{gap}}(११७) ज्याचें जें काम तें त्याचें त्याला. ज्याचा जो मोठेपणा त त्याचा त्याला. कवि आपल्यापरी मोठा. राजा आपल्यापरी मोठा. आणि हें खरेंच आहे. अेकाचें काम दुसऱ्याला लाभलें नाही, आणि लाभते तर कदाचित तें त्याला नीट करतांहि आलें नसतें. योगायोग असा घडलाहि की, हाच ऑगस्टस बादशहा वाङ्मयप्रेमी असल्याने, त्याला स्वतःला अेकदा नाटक लिहिण्याची हौस आली. म्हणून त्याने ग्रीक पद्धतीचें अेक शोकपर्यवसायी नाटक लिहिलें. त्यांतील नायक ॲजेक्स हा शेवटीं आपल्या तरवारीवर पडून आत्मघात करितो अशी कथा होती. पण शेवटी बादशहालाच तें नाटक पसंत पडले नाही. तें बाहेर काढण्याची त्याला छाती होअीना. म्हणून तें त्याने आपल्या हाताने फाडून टाकलें. पुढे कोणा एका स्नेह्याने त्याला विचारलें.<noinclude></noinclude>
4y3bi30j0nmbr3k0g5itz5sdrri042v
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३४
104
102941
233023
209868
2026-07-09T16:48:25Z
कल्पनाशक्ती
3813
233023
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१२७}}
{{rule}}</noinclude>बसतात. तीच गोष्ट कांही ललितकला व त्यांतील कलावंत यांचीहि समजावी. कारण उत्कृष्ट गवअी, उत्कृष्ट चितारी, उत्कृष्ट नट-नर्तक, अुत्कृष्ट शिल्पी हा वाङमयसाहित्य वाचून तयार होत नसतो. पण तो बराचसा स्वयंसिद्ध असतो व त्याला कांही ज्ञान, वर सांगितल्याप्रमाणें, परंपरागत तोंडी दुसऱ्याकडून व कांही स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष करून मिळालेलें असतें.</br>
{{gap}}(१२३) हें असें आहे तर साहित्य वाङ्मय यांना जगांत अितका मान कां मिळावा ? आणि मिळाला तर तो सर्वस्वी अकारण असेल काय ? मात्र हा मान सर्व देशांत मिळत आलेला आहे हें खरें. कोणत्याहि देशाचा अतिहास लिहितांना त्या देशांतील वैभवसंपन्न राजे, पराक्रमी वीर, चतुर मुत्सद्दी अित्यादिकांच्या बरोबरीने त्यांतील तत्त्ववेत्ते, कवि, पंडित, विद्वान, साहित्यिक यांचीहि माहिती व वर्णनें अितिहासकार देतात. किंबहुना तीं दिल्याशिवाय आपल्या ग्रंथाला पूर्णता आली असें त्यांना वाटत नाही. आपल्या आर्यभूमीचेंच अुदाहरण घेअूं. यांतील वैय्याकरण मीमांसक साहित्याचार्य यांनी मनुष्यवाणीच्या शब्दाला सर्वोत्तम स्थान दिलें आहे व त्याचें मूल्य सर्वश्रेष्ठ ठरविलें आहे. याविषयी कांही वचनें देतां येतील. 'एकः शब्दः सम्यक् ज्ञातः सम्यक् प्रयुक्तः स्वर्गे लोके कामधुक् भवति ' - 'एकच शब्द पण त्याचा खरा अर्थ समजला व त्याचा योग्य अुपयोग केला तर तो 'स्वर्गामध्येहि सर्व मनकामना पूर्ण करूं शकतो.' तसेंच साहित्यशास्त्रकार मनुष्यवाणीचें ( अर्थात् वाङ्मयाचें) वर्णन कसें करतात पाहा. अेकजण म्हणतो-</br>
{{gap}}{{gap}}अिहि शिष्टानुशिष्टानाम् शिष्टानामपि सर्वथा ।</br>
{{gap}}{{gap}}वाचां अेव प्रसादेन लोकयात्रा प्रवर्तते ॥</br>
{{gap}}( या जगांत स्वयंसिद्ध शिष्ट (विद्वान शास्त्रज्ञ ) व शिष्टामागून जाणारे अितर शिष्ट यांच्या वाणीच्या प्रसादानेच सर्व समाजजीवन चालू राहते. )
{{gap}}{{gap}}अिदं अंधतमः कृत्स्नं जायेत भुवनत्रयं ।</br>
{{gap}}{{gap}}यदि शब्दाव्हयं ज्योतिः आसंसारं न दीप्यते ॥</br>
{{gap}}( हें सर्व त्रिभुवन एरवी ( अज्ञान ) अंधकाराने भरून गेलें असतें पण तें जात नाही याचें कारण शब्द ( मनुष्यवाणी - वाङ्मय) नांवाची जी अेक ज्योत आहे ती सर्व जगभर आपल्या प्रकाश पाडीत राहिली आहे.){{nop}}<noinclude></noinclude>
o61deak6kgithpatswk2hg1k8qisyyu
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३५
104
103029
233024
209869
2026-07-09T16:49:03Z
कल्पनाशक्ती
3813
233024
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१२८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}{{gap}}{{gap}}'''गौर्गोः कामदुधा सम्यक् प्रयुक्ता स्मर्यते बुधैः'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''दुष्प्रयुक्ता पुनर्गो त्वं प्रयोक्तुः सैव शंसति'''</br>
{{gap}}( वाणी-वाङ्मय-याचा योग्य अुचित अुपयोग केला तर ती गाईसारखी दूध देऊन मनोरथ पूर्ण करते. पण तोच जर तिचा अनुचित अुपयोग होअील तर तो करणारा बैलच म्हणावा लागतो. )</br>
{{gap}}अशीं किती तरी आणखी संस्कृत वचनें देतां येतील. साहित्य व वाङ्मय यांच्या गुण वर्णनासंबंधी मराठी भाषेंतीलहि दोनच अुतारे घेअूं. अेक ज्ञानेश्वरांचा व दुसरा श्रीरामदासांचा. दोघांहि संतकवींनी ग्रंथारंभीं वाङ्मयप्रशस्ति केली आहे ती अशी-</br>
{{center|'''रामदासांची कविस्तुति'''}}
{{gap}}{{gap}}{{gap}}शब्दरत्नाचे सागर{{gap}}{{gap}}{{gap}}-ज्ञानियांचा परमार्थुं</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}शब्दसृष्टीचे अीश्वर{{gap}}{{gap}}{{gap}}-मुमुक्षूंचें अंजन</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}सरस्वतीचें निजस्थान{{gap}}{{gap}}{{gap}}-साधकांचें साधन</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}नाना कळांचें जीवन{{gap}}{{gap}}{{gap}}-सिद्धांचें समाधान</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}बोलके चिंतामणी{{gap}}{{gap}}{{gap}}-स्वधर्माचा आश्रय</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}कामधेनूची दुभणी{{gap}}{{gap}}{{gap}}-मनाचा मनोजय</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}कल्पनेचे कल्पतरू{{gap}}{{gap}}{{gap}}-ध्यानस्थांची ध्यानमूर्ति</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}प्रेमळांची प्रेमळ स्थिति{{gap}}{{gap}}-सामर्थ्यवंताची सत्ता</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}वाग्विलास करणारी शक्ति{{gap}}{{gap}}-सकळसिद्धींचा निर्धार</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}सृष्टीचा अलंकार{{gap}}{{gap}}{{gap}}-देवाचे रूपकर्ते</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}विचक्षणाची कुशलता{{gap}}{{gap}}{{gap}}-विवेकनिधीचें भांडार</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}लक्ष्मीचा शृंगार{{gap}}{{gap}}{{gap}}-निरंजनाची संपत्ति</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}अमृताचे ओघ{{gap}}{{gap}}{{gap}}- विराटाची योगस्थिति</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}नवरसाचे मेघ{{gap}}{{gap}}{{gap}}-भक्तीची फलश्रुति</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}नाना सुखांचें सरोवर{{gap}}{{gap}}-अीश्वराचा पवाड</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}सुखाचीं तारवें{{gap}}{{gap}}- आदिशक्तीचें ठेवणें</br>
नसता कवींचा व्यापार । तरी कैचा असता जगदोद्धार | म्हणोनी
कवी हे आधार । सकळ सृष्टीसी ॥{{nop}}<noinclude></noinclude>
i2lvkwgyg2lotnm6xnn51yb432jhby2
233026
233024
2026-07-09T16:55:52Z
कल्पनाशक्ती
3813
233026
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१२८]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}{{gap}}{{gap}}'''गौर्गोः कामदुधा सम्यक् प्रयुक्ता स्मर्यते बुधैः'''</br>
{{gap}}{{gap}}{{gap}}'''दुष्प्रयुक्ता पुनर्गो त्वं प्रयोक्तुः सैव शंसति'''</br>
{{gap}}( वाणी-वाङ्मय-याचा योग्य अुचित अुपयोग केला तर ती गाईसारखी दूध देऊन मनोरथ पूर्ण करते. पण तोच जर तिचा अनुचित अुपयोग होअील तर तो करणारा बैलच म्हणावा लागतो. )</br>
{{gap}}अशीं किती तरी आणखी संस्कृत वचनें देतां येतील. साहित्य व वाङ्मय यांच्या गुण वर्णनासंबंधी मराठी भाषेंतीलहि दोनच अुतारे घेअूं. अेक ज्ञानेश्वरांचा व दुसरा श्रीरामदासांचा. दोघांहि संतकवींनी ग्रंथारंभीं वाङ्मयप्रशस्ति केली आहे ती अशी-</br>
{{center|'''रामदासांची कविस्तुति'''}}
{{Block center|<poem>शब्दरत्नाचे सागर{{gap}}{{gap}}{{gap}}-ज्ञानियांचा परमार्थुं
शब्दसृष्टीचे अीश्वर{{gap}}{{gap}}{{gap}}-मुमुक्षूंचें अंजन
सरस्वतीचें निजस्थान{{gap}}{{gap}}{{gap}}-साधकांचें साधन
नाना कळांचें जीवन{{gap}}{{gap}}{{gap}}-सिद्धांचें समाधान
बोलके चिंतामणी{{gap}}{{gap}}{{gap}}-स्वधर्माचा आश्रय
कामधेनूची दुभणी{{gap}}{{gap}}{{gap}}-मनाचा मनोजय
कल्पनेचे कल्पतरू{{gap}}{{gap}}{{gap}}-ध्यानस्थांची ध्यानमूर्ति
प्रेमळांची प्रेमळ स्थिति{{gap}}{{gap}}-सामर्थ्यवंताची सत्ता
वाग्विलास करणारी शक्ति{{gap}}{{gap}}-सकळसिद्धींचा निर्धार
सृष्टीचा अलंकार{{gap}}{{gap}}{{gap}}-देवाचे रूपकर्ते
विचक्षणाची कुशलता{{gap}}{{gap}}{{gap}}-विवेकनिधीचें भांडार
लक्ष्मीचा शृंगार{{gap}}{{gap}}{{gap}}-निरंजनाची संपत्ति
अमृताचे ओघ{{gap}}{{gap}}{{gap}}- विराटाची योगस्थिति
नवरसाचे मेघ{{gap}}{{gap}}{{gap}}-भक्तीची फलश्रुति
नाना सुखांचें सरोवर{{gap}}{{gap}}-अीश्वराचा पवाड
सुखाचीं तारवें{{gap}}{{gap}}- आदिशक्तीचें ठेवणें</poem>}}
{{gap}}नसता कवींचा व्यापार । तरी कैचा असता जगदोद्धार । म्हणोनी कवी हे आधार । सकळ सृष्टीसी ॥{{nop}}<noinclude></noinclude>
bgm7ks5363a0irflpakpm2y3smgswpf
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३६
104
103030
233025
209870
2026-07-09T16:52:20Z
कल्पनाशक्ती
3813
233025
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१२९}}
{{rule}}</noinclude>{{gap}}नाना विद्या ज्ञातृत्व कांही । कवीश्वरावीण नाही । कवीपासूनि
सर्वही । सर्वज्ञता ॥</br>
{{center|'''ज्ञानेश्वरकृत गणपतिस्वरूप'''}}
{{Block center|<poem>वेद - मूर्ति
निर्दोष वर्ण - सौंदर्य
स्मृतिग्रंथ - अवयव
पुराणें-रत्नखचित अलंकार
तत्त्वें - रत्नें
छंदोबद्धता - कोंदणें
अुत्तम शब्दरचना -वस्त्र
शब्दार्थालंकार - चकचकीत तंतु
काव्यनाटकें - पायांतील घागऱ्या
कविबुद्धि - कमरेचा शेला
षट्शास्त्रें -सहा हात
तत्त्वदर्शनें - आयुधें
वेदान्त - मोदक
ब्रह्मसुखानंद - सोंड
ज्ञान - डोळे
चर्चा व वाद - दांत
अभय मीमांसा - कान
द्वैताद्वैत - गंडस्थळें
अुपनिषदें - मस्तकावरील पुष्पें</poem>}}
{{gap}}(१२४) रामदासांनी कवींना अुद्देशून हीं सर्व विशेषणे लावलेली असली, तरी त्यांच्या डोळ्यापुढे मुख्यतः वाल्मीकि व व्यास हेच दोन कवि असावेत असें वाटतें. कित्येकांच्या मतें रामदास स्वतः कवि असल्याचा अभिमान त्यांना होता म्हणून स्वजातीयांची स्तुति करणें त्यांना प्रिय असणारच. मग त्यांच्या डोळ्यापुढे कोण कवि असतील देव जाणे. पण आपणापुढे प्रश्न तो नाही. समर्थांनी कवींना लावलेली विशेषणें लक्षांत<noinclude><br>{{gap}}मा. ज. अ. ९</noinclude>
paojcniapal45i6iiil42nwm1sbm55j
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३८
104
103032
233027
209872
2026-07-09T16:56:39Z
कल्पनाशक्ती
3813
233027
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१३१}}
{{rule}}</noinclude>अुपयोगी पडत नाहीत. पण त्यागाश्रित पुण्याअी व अध्यात्मसंस्कृति ही मात्र आत्म्याबरोबर परलोकीं जाअूं शकते. आपल्या सर्व भारतीय शास्त्रदर्शनांची फलश्रुति मोक्ष हीच सांगितलेली असते नव्हे काय ? मात्र अशा प्रकारच्या युक्तिवादाशिवाय वाङ्मयसाहित्यमंडित कवि व पंडित यांना समाजांत श्रेष्ठ स्थान कां देण्यांत येतें याची अुपपत्ति लागू शकत नाही. मात्र जे कोणी परलोक मानीत नाहीत ते केवळ विद्वत्तेला अितकेंसें महत्त्व देत नाहीत. ते कर्तृत्व हाच मुख्य गुण मानतात. मग कर्तृत्वाच्या जोडीला विद्वत्ता असेल, तर तें अधिक चांगलें, द्विगुणित चांगलें, अितकेंच काय तें .</br>
( १२७ ) साहित्य हें अेक संस्कृतिप्रकर्षाचें साधन आहे, आणि त्याबरोबर अितर कलांनाहि तशाच प्रकारचें साधन मानतां येतें. तथापि वाङमयसाहित्याला त्यांतल्या त्यांत श्रेष्ठपद मिळण्याचें आणखी अेक कारण हें असावें की, या साधनांचा पल्लेदारपणा अितरांहून अधिक आहे. मनुष्याचें मन व हृदय हीं खुलासेवार प्रकट करण्याची शक्ति वाचेच्या कलेंत, व तदनुसार लेखनकलेंत, जितकी आहे तितकी चित्र, नाट्य, नृत्य, संगीत यांत नाही. अंतिम आनंद सर्व कला सारख्याच देतात. स्वतःला क्षणभर विसरून जाणें हें आनंदाचें अंतिम गमक मानलें, तर तो आनंद सर्व कला सारख्याच प्राप्त करून देतील. पण कर्तृत्वाच्या दृष्टीने व कार्यव्यापाच्या दृष्टीने पाहतां वाङमयकला या अधिक पराक्रमी ठरतात. अितर कलाकृतींचे निर्माते व त्यांचें सौंदर्य अुपभोगणाऱ्या व्यक्ति यांचा मेळ पडणें फार दुरापास्त होतें. पण वाङ्मयाचें तसें नाही. पुस्तकांतून चित्रें छापतां येतात, फोनोग्राफच्या तबकड्यांत गायन लिहून त्याच्या प्रती काढतां येतात, तसेंच छाप बनवून मूर्तीहि तयार करतां येतात, आणि संगमरवरी ताजमहाल चार आण्याला मिळतो हें सर्व खरें. तथापि ग्रंथांची निर्मिति जितकी होते तितकी या अितर वस्तूंची होत नाही. शिवाय हाताळणें, वापरणें यांच्या सोयीच्या दृष्टीने हि वाङमयग्रंथ हा अधिक व्यवहार्य ठरतो. तसेंच जीवनाचें अगणित गुण व अगणित प्रकार प्रतिबिंब दाखविणें हें अगणित वर्णसमूहरूप वाणीला व लेखनाला जसें साधेल तसें मर्यादित व्याप्तीच्या चित्रांना, गीतांना, मूर्तींना, शिल्पकृतींना सावणार नाही.{{nop}}<noinclude></noinclude>
0on4xui9aw63gjlg6x4csais0biailk
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३९
104
103051
233028
209873
2026-07-09T16:57:45Z
कल्पनाशक्ती
3813
233028
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१३२]}}{{right|[माझा जन्मभरचा}}
{{rule}}</noinclude>{{gap}}( १२८) या वाङमयसाहित्याचा अधिकार ज्याला मध्यम वर्ग म्हणतात, आणि पूर्वीच्या आंकडेगणितांत ज्यांचा अुल्लेख सर्वांत लहान म्हणून केलेला आहे, अशाच अेका लहानशा वर्गाकडे येअून बसलेला आढळतो. ज्यांचा व्यवहार वाङमयाच्या ज्ञानाशिवाय अडत नाही असे लोक शेंकडा ९८-९९ असतात हें पूर्वीं सांगितलेंच आहेत. अुरला अेक-दोन टक्के वर्ग हाच काय तो कधी काळीं वाङमयसाहित्य वाचणारा. पण फिरून त्यांपैकीच फार थोड्या लोकांना स्वतः वाङ्मयसाहित्यनिर्मिति करतां येते. अेकीकडे श्रीमान वर्ग हा आपल्याच अैश्वर्योपभोगांत मग्न असतो, सुखावलेला असतो, श्रम केल्याशिवाय त्याला जगतां येतें. तो वाङ्मय-साहित्यांत लक्ष घालीत नाही. आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड असा दरिद्री किंवा गरीब लोकांचा वर्ग. श्रीमान लोक कदाचित साक्षर तरी असतात पण गरीब लोकांना धन नाही त्याप्रमाणें साक्षरताहि नाही. मग ते बिचारे वाङ्मयनिर्मिति काय करणार ? तात्पर्य, मानवजातीच्या अितिहासाकडे पाहिलें तर मध्यम वर्ग हाच सर्वांत महत्त्वाचा ठरतो. याचें कारण समाज जिवंत राहण्याला ज्या हालचाली, जीं परिवर्तनें, व ज्या क्रांत्या, आवश्य असतात त्या सर्व या मध्यम वर्गाच्या मनांतून निर्माण होतात. समाज-जीवनाच्या अथांग समुद्रावर जीं वादळें आजपर्यंत झालीं आहेत तीं सर्व या मध्यम वर्गाच्या केंद्रभूमींतच झाली आहेत. कारण काय असेल तें असो, पण मध्यम वर्गांतील सुशिक्षित मनुष्य हा असा असतो की, सामाजिक वातावरणाचा दाब, व त्यांतील आर्द्रता रूक्षता, ही मोजणारा बॅरॉमीटर होण्याची पात्रता फक्त या मध्यम वर्गाच्याच अंगी असतें. या वर्गांतील लोकांनीच ग्रंथ रचले, वाचले, संभाळले व लोकांना समजून सांगितले. हें काम अेका टोकाच्या श्रीमंतांनी व दुसऱ्या टोकाच्या दरिद्री लोकांनी कधीहि केलेलें नाही. म्हणून श्रीमंताला वेळेचें काय करावें हें समजत नाही, व गरिबाला कांही करावेंसें वाटलें तर त्याला वेळ नाही. म्हणून दोघेहि सारखेच निरुपयोगी. मध्यम वर्ग हाच अेक असा आहे की, जो आळशी होण्याअितका सुखावलेला नाही व सुखाच्या विश्रांतीचा अेक क्षणहि मिळत नाही असा दरिद्री नाही. मनुष्याला विश्रांतीचा असा काळ थोडा तरी मिळणें यावरच जगाची प्रगति बरीचशी अवलंबून असते. तत्त्ववेत्ता बरट्रँड रसेल म्हणतो--{{nop}}<noinclude></noinclude>
b9rmfhj97ts8jyu123t3833xt1jcrhu
पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१४०
104
103176
233029
209874
2026-07-09T16:58:36Z
कल्पनाशक्ती
3813
233029
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१३३}}
{{rule}}</noinclude>{{gap}}"It is the small leisured class which contributed nearly the whole of what we call civilisation. That class cultivated the arts and discovered the Sciences. It wrote the books, invented the philosophies, and refined social relations. Even the liberation of the oppressed has usually been inaugurated from above. Without the leisured class mankind would never have emerged from barbarism.</br>
{{right|(In Praise of Idleness, page 26)}}
कांही थोडी फुरसत असणारा मध्यम वर्गाचा हा विद्वान् मनुष्य थोडें मिळवूं शकतो, पण थोड्यांतच संतुष्ट असतो. बुद्धि व शिक्षण यांच्या योगाने त्याला कांही मोजक्या वेळांत चरितार्थाचें साधन मिळवितां येतें, व अुरला थोडा वेळ सत्कार्थी लावण्याची त्यालाच बुद्धि होते. समाजाचे चुकतें कोठे व तें बरोबर कसें करावें याचा विचार करण्याला वेळ व पात्रता दोनहि त्याला असतात. तो श्रीमंतांअितका स्वार्थी नसतो व गरिबांअितका गरजू नसतो. वेळेस तो श्रीमंताच्या संपन्नतेची मदत मागेल व घेअील, व वेळेस गरिबांत मिसळून गरिबांच्या ख्याबलाचा युक्त कार्याला अुपयोग करील. पण कोणतीहि सामाजिक क्रांति घडून आल्यावर, विशेष लाभ किंवा विशेष हानि स्वतःच्या पदरांत न पडतां पूर्वस्थितीवर कोणी राहील, तर तो मध्यम सुशिक्षित वर्गच होय.</br>
{{gap}}(१२९) आता या मध्यम वर्गातील साहित्यिक लोकांवर लक्ष्मी-देवीची अवकृपा कशी असते हें महाराष्ट्रीय साहित्यिकांचीं अुदाहरणेंच देअून सांगतों. मराठी साहित्यिकांमध्ये अग्रपूजेचा मान संत कवींना. पण कवि म्हणून त्याना कोणा राजाचा आश्रय होता असें आढळत नाही. ज्यांना तो लाभला ते संत व राजगुरु किंवा पूजनीय असें मानवी दैवत म्हणून. कवि म्हणून नव्हे. महानुभाव पंथी कवि हे फार तर मठ-
वासी महंत असतील. पण मठाचा निर्वाह भिक्षावृत्तीवरच अवलंबून धर्मदीक्षेनें त्यांनी दरिद्रीच राहावयाचें होतें. आणि त्यांनी साहित्याची अुपासना केली ती धर्मोपदेशाकरिता, ग्रंथविक्रीने द्रव्य मिळविण्याकरित<noinclude></noinclude>
ktcij91s8pcgxcwitobs6xz8iudulio
माझा जन्मभरचा एक उद्योग
0
110927
233000
2026-07-09T15:52:53Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = माझा जन्मभरचा एक उद्योग | साहित्यिक = नरसिंह चिंतामण केळकर | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = 1959 | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="माझा जन्मभराचा ए..."
233000
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा जन्मभरचा एक उद्योग
| साहित्यिक = नरसिंह चिंतामण केळकर
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील =
| वर्ष = 1959
| टिपण =
| वर्ग =
| दालन =
}}
<pages index="माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf" from=1 to=192 />
[[वर्ग:माझा जन्मभरचा एक उद्योग]]
s706xssplcq3xttmzaslwhgwmw9u65w