विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.10 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८५ 104 66750 233063 151547 2026-07-10T16:24:03Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233063 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१८०|स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>आहे. या साऱ्या गोष्टींची आठवण करून मी तुम्हांला पुनःपुन्हां हेच सांगतों की बाबांनो, अपार मनौदार्य मिळवा. तुमची उपनिषदें ही सामर्थ्याची खाण आहे. साऱ्या जगाला पुरून उरण्याइतका सामर्थ्याचा साठा उपनिषद् ग्रंथात आहे. त्यांच्याद्वारे साऱ्या जगाला नवें चैतन्य आणता येईल. कोणत्याही पंथाचा, धर्माचा अथवा जातीचा कोणीही मनुष्य असो, आमच्या उपनिषदांची रणतुतारी वाजली की तो खडबडून जागा होईल. जागे व्हा, उठा आणि मुक्त व्हा असा घोष उपनिषदें करीत आहेत. शारीरस्वातंत्र्य, मनःस्वातंत्र्य आणि चैतन्यस्वातंत्र्य हेच आमच्या उपनिषदांचे मुख्य बुरूज आहेत.<br> {{gap}}जगांत अनेक धर्मशास्त्रे निर्माण झालेली आहेत; पण त्यांत पूर्ण मुक्तीचा मार्ग कोणीही दाखविला नाही. सलोपता, समीपता अथवा सरूपता यांपलीकडे कोणाचीही मजल गेली नाही. कैवल्य मुक्तीचा मार्ग उपनिषदांनी मात्र दाखविला आहे. तरी यांचा आधार घेऊन सृष्टीने घातलेल्या हद्दीचे उल्लंघन तुम्ही खुशाल करा. आज अनेक प्रकारचे दौर्बल्य तुमच्या अंगी आहे, पण उपनिषदांच्या आधाराने तुम्ही चालला तर हे सारें दौर्बल्य नष्ट होईल, आणि आपण वास्तविक दुबळे कधीच नव्हतों असा अनुभव तुह्मांस येईल. आज तुम्ही द्वैती अहां हे उघड आहे. तथापि असे असले तरी त्याला आमची उपनिषदें हरकत घेत नाहीत. आत्मा स्वभावतःच परिपूर्ण आहे ही गोष्ट निःसंशय खरी असल्याचे आपण वारंवार सिद्ध केले आहे. स्वभावतः परिपूर्ण असलेला आत्मा कर्मानुसार आकुंचित होऊन राहिला आहे, या मतांत श्रीरामानुज आणि अर्वाचीन काळांतले उत्क्रांतिवादी यांचे विलक्षण साम्य आहे, ही गोष्ट विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. परिपूर्ण आत्म्याच्या शक्तीचे आकुंचन होऊन त्या बीज रूप होतात, आणि याच बीजाला सत्कृत्यांचे पाणी मिळाले म्हणजे तीच रुजून त्यांचा मोठा वृक्ष होतो. सत्कृत्ये आणि सद्विचार या गोष्टी या बीजाचें पोषण करतात आणि त्याला मोड आणून वाढीस लावतात. अशा रीतीने हे झाड वाढीस लागून शेवटी पहिल्या पूर्ण दशेला येतें. अद्वैतवाद्यांचा जो थोडासा मतभेद या ठिकाणी आहे, तो इतकाच की ही उत्कांति आत्म्याची नसून सृष्टीची आहे असे ते म्हणतात. उत्क्रमण अथवा अपक्रमण यांपैकी कोणत्याही अवस्थेचा संपर्क आत्म्याला लागत नाहीं असें अद्वैतवाद्यांचें<noinclude></noinclude> 30cjcwx7q134qxy6iwmn0n3y90qdjkg पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१४८ 104 103267 233030 209882 2026-07-10T15:12:29Z कल्पनाशक्ती 3813 233030 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" /></noinclude>{{border|maxwidth=500px|bstyle=dashed|bthickness=5px|color=black|align=center| {{center|{{x-larger|'''हार्दिक अुद्गार !'''}}}} {{center|'''( न. चिं. केळकर )'''}} {{Block center|<poem>'मंदार-माला' स्वयें गुंफिली ती मुदें अर्पितों शारदे त्वत्पदीं सद्भाग्य पूजा कराया मिळे आज, जें लाभलें नाही पूर्वी कधी निष्ठा तपें चार मी ठेविली त्वत्प्रसादामृतें येतसे ती फळा भक्ति स्फुरे अंतरीं गद्गदोनी परी बोल ना येत दाटे गळा अस्तासि जाया निघे सूर्य त्याची प्रभा शांत शीत स्मिताचे परी भासे जनाला, परी अुष्मिता ती तयाची न लोपे मुळीं अंतरीं पक्षी दिनांतीं दिशामूढ अर्थांध शोधीत जाती घरें कोटरें प्रज्ञा मदीया प्रदीर्घाक्ष होवोनि विश्वावरूनीहि साऱ्या फिरे गात्रांसि ये जीर्णता दंतपंक्ती त्यजोनी निवाली मुखाच्या गृहा ग्रीष्मप्रतापें तृणें होति अुच्छिन्न तैसाचि मत्केशसंभार हा परी पाझरे माझिया अंतरींची अखंड प्रवाही झरी प्रेमळा सदा राखितों शिंपूनी मी तियेच्या जळाने मनाचा पहा हा मळा वार्धक्य वाटे गुहाद्वार मृत्युपुरीचे तया लोक सारे भिती अदृश्य दुःखें मनश्चक्षु त्यांतें विचित्र प्रकारें किती दाविती परी शैलशीर्षासनीं वाटतें मी बसे निर्भयप्राय होवोनिया की लोभमोहादि आयुष्यमार्गांतलीं संकटें सर्व गेलीं लया अेकांतिच्या अंधकारीं स्मृती हृत्पटीं नाचवीं चित्रमाला जरी दे ना मना दुःख वा भोगलेल्या सुखांची न हानी गमे अंतरीं मनें सेविलें तें हिरावोनि कोणी न घे माझियापाशिं माझें अुरें अेका जिवा अेक आयुष्यकालीं मिळालें मला कां न व्हावें पुरे अिच्छा न केली कधी दुर्लभा वांछितांची मनाने अधाशापरी सोडोनिया स्वस्वभावा परांच्या यशाची कधी मी स्पृहा ना घरी अीशप्रसादें निसर्गप्रभावें जसा जाहालों मी तसा राहुनी सुस्वाभिमाना जनीं रक्षियंलें कधी आलि ना खिन्नता मन्मनीं केल्या न मी वल्गना विक्रमाच्या अहंकार खोटा न तो दाविला झालों न मी सांप्रदायी सभोंती कधी शिष्यमेळा कुणि पाहिला ?</poem>}} }}{{nop}}<noinclude></noinclude> huzi36c0baossewr72fu8xag4yv16w6 पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१४९ 104 103268 233031 209883 2026-07-10T15:13:16Z कल्पनाशक्ती 3813 233031 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" /></noinclude>{{border|maxwidth=500px|bstyle=dashed|bthickness=5px|color=black|align=center| {{Block center|<poem>पुरा आत्मविश्वास ठेवोनियां अंतरंगीं सदा राहिलों अेकला नक्षत्रपुंजाविणें कां न शोभे नभीं अष्टमीच्या शशीची कला ? अुंचांतल्या अुंच अद्रीवरी बैसुनीं पक्षिराजें जरी झाडिले स्वपक्ष प्रभावी तरी पाडि तो काय पृथ्वीवरी तारकांचीं फुलें महामत्स्य झाला समुद्रांत राजा तरी व्यापि तो काय साऱ्या जळा पूर्णेंदु तारागणा लोपवी तो तरी पंधरा त्या न सोळा कळा अुडी वैनतेयापरी घ्यावयातें न हव्यास केला कधीही बळें स्वसामर्थ्यपक्षीगणें ओळखावें नभीं स्वैर संचारितां हें कळे तैसेंच ना लोभवीलें मला पंजराने जरी स्वर्णकांती तया स्वातंत्र्यभोगीं मिळालीं वनीं तीं बहु मानिलीं मीं फळें खावया ऋणादान केलें मुळीं ना कुणाचें धनीं वाङ्मयीं वा म्हणोनी मना कधी आलि ना लाज वा अंतरंगीं न सोसावया लागली यातना परी दान केलें यथाशक्ति सर्वांसि सत्पात्र पाहोनियां वा भले भरो अल्प तत्कार्यमानें परंतु समाधान तेणें मला लाभलें लहानासि थोरांपरी वागवीलें सदा मानसीं प्रेम ठेवोनियां वरिष्ठांस मी आदरें पूजियेलें यथायोग्यतेने स्मरोनी नया परी दुष्टभावें पथीं येति त्यांना न भ्यालों करायास वाक्ताडना जशासी तसें हीच नीती खरी या जगीं अन्य कांही न माने मना असे सत्य संकल्प हा धर्म मोठा असे आत्मनिष्ठा प्रभावी बळ विधाता करी स्वार्थ कार्यीं नराच्या जरी न्यायतेजें न तो अुज्ज्वळ ऋजू बुद्धिमार्गे जनें वर्तणें यासमा नाहि नीती दुजी श्रेयसी कधी वक्रबुद्धी धरोनी कुणाशीं न आजन्मिं मी वागलों मानसीं महाराष्ट्र-सारस्वताब्धीमधीं पोहणारा असे अल्पसा मीन मी ' म्हणोनी तया अब्धिच्या देवते-शारदेलागि नम्र स्वभावें नमीं जिने वाक्समुद्रांतले शोषुनी क्षार केलें मधु क्षीर त्या सागरा क्रीडा करायास सत्पात्र देखोनियां अर्पिलें प्रेमभावें नरा जिने शुभ्र तेजाळ वाङमौक्तिकांतें पहा स्फूर्तिच्या विक्रमें निर्मिलें अलंकाररूपा तयां द्यावयाला मनःशुक्तिच्या संपुटीं रक्षिलें जिने नच्रु वक्रोक्तिचे संग्रहीं ठेवुनी पाळिले दुर्जनां दंडण्या तशा बालकां कौतुकाने रमाया जिने गोड़शा निर्मिल्या काहण्या</poem>}} }}<noinclude></noinclude> 0qg87ujoogsgnf6ajumvltw9vxqjh9z पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५० 104 103269 233032 209884 2026-07-10T15:14:05Z कल्पनाशक्ती 3813 233032 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" /></noinclude>{{center|'''परिशिष्ट : १'''}} {{center|आत्मचरित्रपर मुलाखती}} {{center|( १ )}} {{gap}}[ तात्यासाहेब केळकर यांच्या पुढील मुलाखती वाचतांना ५० वर्षांतील त्यांच्या मनोभूमीचा चित्रपट अगदी जवळ बसून आपण पहात आहों असें वाटतें. प्रत्येक प्रश्नाचें अुत्तर म्हणजे तात्यासाहेबांच्या आयुष्याचें अेक दालन आहे असा भास होतो. मुलाखत संपली तरी वाचकाच्या विचारांची परंपरा संपत नाही. ]</br> {{gap}}प्रश्न -- आपलें बालपण मिरजेत गेलें असूनहि आपण वकिली करण्यासाठी साता-याला आला हें कसे ?</br> {{gap}}अुत्तर -- माझा शिक्षणक्रम संपला त्यावेळी वडील संस्थानच्या सेवेंतून निवृत्त झाले होते. थोरले बंधु बी. अे. होअून सातारच्या सरकारी हायस्कूलांत शिक्षक होते. तेथेच आमची सर्व मंडळी रहात होती; म्हणून साताऱ्यास आलों झालं !</br> {{gap}}प्रश्न -- शाळा अगर कॉलेज यांमध्यें असतांना कांही शिक्षकांच्या सहवासापासून आपल्याला विशेष फायदा झाला असें म्हणता येअील का ?</br> {{gap}}अुत्तर -- माझ्या स्वभावाची घडणच अशी आहे कीं, कोणाच्याहि सहवासामुळें माझ्या मनावर पगडा बसूं शकत नाही. चांगलें आढळेल तें मी कोणापासूनहि घेतों. त्यामुळे, विशेष अशी छाप मजवर कोणत्याहि शिक्षकाची पडूं शकली नाही. कै. वासुदेवशास्त्री खरे हे मिरजेच्या शाळेंत माझे शिक्षक होते. त्यांचा माझा मात्र विशेष परिचय झाला व तो अखेरपर्यंत टिकला.{{nop}}<noinclude></noinclude> f7j1jtywz5yy49zof69s5xrvh0ouipd पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५१ 104 103270 233033 209885 2026-07-10T15:14:45Z कल्पनाशक्ती 3813 233033 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१४४]}}{{right|[माझा जन्मभरचा}} {{rule}}</noinclude>{{gap}}प्रश्न --- विद्यार्थीदशेत अगर तदनंतर वाचिलेल्या कोणत्या ग्रंथांवर आपली विशेष भक्ति जडली ?</br> {{gap}}अुत्तर -- आमच्या विद्यार्थीदशेंत 'मराठी गद्य' फारसें अुदयाला आलेच नव्हतें. विष्णुशास्त्री चिपळूणकर व आगरकर यांखेरीज दुसरा नांव घेण्यासारखा लेखक त्यावेळी कोणी नव्हताच. या दोघांचेहि लेख मी विद्यार्थीदशेंत आवडीने वाचीत असे. त्यावेळी माझें जुन्या मराठी काव्याचें वाचन बेताचेंच होतें. ज्ञानेश्वर, रामदास व मोरोपंत या कवींचा कांही भाग मी वाचला होता.</br> {{gap}}प्रश्न -- आपल्या विशेष आवडीचे असे अिंग्रजी ग्रंथकार कोणते ?</br> {{gap}}अुत्तर -- मेकॉले, गोल्डस्मिथ्, अिर्मसन् व गिबन् यांचे ग्रंथ माझ्या विशेष आवडीचे आहेत. त्यांतल्या त्यांत गिबन् बद्दल मला विशेष आदर वाटतो.</br> {{gap}}प्रश्न -- विद्यार्थीदशेंत असतां आपला विशेष लौकिक कशाबद्दल असे ?</br> {{gap}}अुत्तर -- तसें म्हणाल तर मला केव्हाहि क्लास मिळाला नाही. परीक्षेंत नापास झालों नाही म्हणजे बस्स, असेंच माझें एकंदर धोरण असें. आमच्या ' अण्णा ' प्रमाणे ( श्री. तात्यासाहेबांचे द्वितीय चिरंजीव) शरीर-संपदा कमावण्यासाठींहि मी विशेष झटलों नाही. तरी हरतऱ्हेच्या खेळांत मी भाग घेत असें. स्नेह्यांमधली भांडणें तोडण्यासाठी मध्यस्थी करण्याबद्दल मात्र माझा चांगलाच लौकिक असे.</br> {{gap}}प्रश्न -- लेखनव्यवसायांत नांव कमाविता येअील अशी कल्पना आपल्या मनांत केव्हा प्रादुर्भूत झाली ?</br> {{gap}}उत्तर -- बी. अे. च्या वर्गांत असतांना मला प्रथम असें वाटू लागलें कीं, आपण भाषाशैली कमवावी व मराठी वाङ्मयांत नव्या नव्या धाटणी (Forms) आणाव्या.</br></br> {{gap}}प्रश्न -- म्हणजे, यापूर्वीच आपण कांहीतरी लिहिलें असावें.</br> {{gap}}अुत्तर -- यापूर्वी मी कांहीच लिहिलें नव्हतें असें नाही; पण तें अगदीच फुटकळ!{{nop}}<noinclude></noinclude> 98nrrttmhj627bk9hymak8e6cqytxyp पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५२ 104 103271 233034 209886 2026-07-10T15:15:32Z कल्पनाशक्ती 3813 233034 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१४५}} {{rule}}</noinclude>{{gap}}प्रश्न -- मग आपलें पहिलें 'लिखाण' कोणतें ? तें आपण केव्हा लिहिलें ?</br> {{gap}}अुत्तर -- Sheridan च्या The Rivals चें "नवरदेवांची जोडगोळी" हें रूपांतर मी १८९४ च्या डिसेंबरांत लिहिलें. अेल् अेल्.बी.ची परीक्षा देअून साताऱ्यास आलों, रिकामाच होतों; घेतलें लिहायला व निकाल लागण्याच्या आंत संपवूनहि टाकिलें.</br> {{gap}}प्रश्न -- आपण केसरी संस्थेंत दाखल झालां ते केवळ यदृच्छेनेच असें पुष्कळ वेळा म्हटलें जाते तें खरें का ?</br> {{gap}}अुत्तर -- हो, तें सर्वस्वी खरें आहे. केसरीच्या अगर दुसऱ्या अेखाद्या पत्राच्या संपादकमंडळांत शिरण्याचा मी कधीं प्रयत्न केला नव्हता. साताऱ्यास आल्यापासून अेक गोष्ट मात्र मी करीत असें. मराठी व अिंग्रजी-विशेषतः अिंग्रजी निबंध लिहून ते तेथील सुशिक्षित मंडळींच्या सभेंत वाचून दाखविण्याचा मी परिपाठ ठेविला होता. त्यावेळी साताऱ्यास 'बोधसुधाकर' नांवाचें पत्र निघत असे त्यांत व कै. रा. ब. पारसनीस यांच्या 'महाराष्ट्र-कोकिळां 'त मी बरेच वेळा लिहीत असें.</br> {{gap}}प्रश्न - मग, अशा परिस्थितींत आपण केसरीकडे कसे काय वळलां ?</br> {{gap}}अुत्तर -- त्या वेळी साताऱ्यास रानडे नांवाचे एक वकील होते. त्यांचा व टिळकांचा जुना स्नेह. १८९६ साली टिळकांचा व्याप वाढत चालला होता. त्यामुळें लॉ-क्लासचें काम जबाबदारीने पाहील व मराठ्यांत लिहील असा अेकादा मदतनीस टिळकांना हवा होता. सदर्न मराठ्याच्या गाडींतून प्रवास करीत असतां अेकदां टिळकांची व रानड्यांची अचानक भेट झाली. गोष्टीवरून गोष्टी निघाल्या व आपल्याला काय तऱ्हेचा मनुष्य पाहिजे हें टिळकांनी रानड्यांना स्पष्ट करून सांगितले. रानडे यांनी टिळकांना माझें नांव सुचविलें. पुढें टिळकांना भेटण्यासाठीं मी पुण्यास गेलों. टिळकांचे लॉ-क्लासमधील मदतनीस श्री. वाकनीस यांना या सर्व गोष्टींची कुणकुण कळतांच त्यांनी तत्काळ राजिनामा पाठविला व माझ्या कल्पनेपेक्षाहि{{nop}}<noinclude></br>{{gap}}मा. ज. अु. १०</noinclude> 8vqlu9sbhrb8bgg2lj1j8rr5qgqbv5g 233035 233034 2026-07-10T15:15:59Z कल्पनाशक्ती 3813 233035 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१४५}} {{rule}}</noinclude>{{gap}}प्रश्न -- मग आपलें पहिलें 'लिखाण' कोणतें ? तें आपण केव्हा लिहिलें ?</br> {{gap}}अुत्तर -- Sheridan च्या The Rivals चें "नवरदेवांची जोडगोळी" हें रूपांतर मी १८९४ च्या डिसेंबरांत लिहिलें. अेल् अेल्.बी.ची परीक्षा देअून साताऱ्यास आलों, रिकामाच होतों; घेतलें लिहायला व निकाल लागण्याच्या आंत संपवूनहि टाकिलें.</br> {{gap}}प्रश्न -- आपण केसरी संस्थेंत दाखल झालां ते केवळ यदृच्छेनेच असें पुष्कळ वेळा म्हटलें जाते तें खरें का ?</br> {{gap}}अुत्तर -- हो, तें सर्वस्वी खरें आहे. केसरीच्या अगर दुसऱ्या अेखाद्या पत्राच्या संपादकमंडळांत शिरण्याचा मी कधीं प्रयत्न केला नव्हता. साताऱ्यास आल्यापासून अेक गोष्ट मात्र मी करीत असें. मराठी व अिंग्रजी-विशेषतः अिंग्रजी निबंध लिहून ते तेथील सुशिक्षित मंडळींच्या सभेंत वाचून दाखविण्याचा मी परिपाठ ठेविला होता. त्यावेळी साताऱ्यास 'बोधसुधाकर' नांवाचें पत्र निघत असे त्यांत व कै. रा. ब. पारसनीस यांच्या 'महाराष्ट्र-कोकिळां 'त मी बरेच वेळा लिहीत असें.</br> {{gap}}प्रश्न - मग, अशा परिस्थितींत आपण केसरीकडे कसे काय वळलां ?</br> {{gap}}अुत्तर -- त्या वेळी साताऱ्यास रानडे नांवाचे एक वकील होते. त्यांचा व टिळकांचा जुना स्नेह. १८९६ साली टिळकांचा व्याप वाढत चालला होता. त्यामुळें लॉ-क्लासचें काम जबाबदारीने पाहील व मराठ्यांत लिहील असा अेकादा मदतनीस टिळकांना हवा होता. सदर्न मराठ्याच्या गाडींतून प्रवास करीत असतां अेकदां टिळकांची व रानड्यांची अचानक भेट झाली. गोष्टीवरून गोष्टी निघाल्या व आपल्याला काय तऱ्हेचा मनुष्य पाहिजे हें टिळकांनी रानड्यांना स्पष्ट करून सांगितले. रानडे यांनी टिळकांना माझें नांव सुचविलें. पुढें टिळकांना भेटण्यासाठीं मी पुण्यास गेलों. टिळकांचे लॉ-क्लासमधील मदतनीस श्री. वाकनीस यांना या सर्व गोष्टींची कुणकुण कळतांच त्यांनी तत्काळ राजिनामा पाठविला व माझ्या कल्पनेपेक्षाहि<noinclude></br>{{gap}}मा. ज. अु. १०</noinclude> b423n3ffiqu11ejjhcz3h1042dcasrg पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५३ 104 103411 233036 209887 2026-07-10T15:16:52Z कल्पनाशक्ती 3813 233036 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१४६]}}{{right|[माझा जन्मभरचा}} {{rule}}</noinclude>अधिक तांतडीनें मला टिळकांचा 'स्नेही व सहाय्यक' म्हणून पुण्यास यावें लागलें.</br> {{gap}}प्रश्न -- आपण केसरींत आल्यानंतर, ती संस्था सोडण्याचा प्रसंग येतो की काय अशी भीति आपल्याला कधी वाटूं लागली होती का ?</br> {{gap}}अुत्तर -- मी प्रथम मराठा पत्राचें संपादकत्व पत्करलें होतें. १९०५ चे सुमारास लाला लजपतराय यांना अेका इंग्रजी पत्राकरिता संपादकाची जरूर लागली. संपादक शक्य तर महाराष्ट्रीय असावा अशी लालाजींची तीव्र अिच्छा. मी त्या जागीं जावें यासाठी त्यांनी ना. गोखले व टिळक या दोघांनाहि लिहिलें. पण, मी जावें असें टिळकांच्या मनांत नव्हतें; म्हणून शेवटी तें तसेंच राहिलें.</br> {{gap}}प्रश्न -- असा आणखी अेकादा प्रसंग आपल्याला स्मरतो का ?</br> {{gap}}अुत्तर - दुसरा प्रसंग १९०७ च्या सुमारचा आहे. त्यावेळी मी मराठ्याचा संपादक होतों. केसरीचे लेख ज्या त्वेषानें लिहिले जातात त्या त्वेषाने मराठ्याचे लेख लिहिले जात नाहीत असें माझ्याबद्दल गाऱ्हाणें सांगणारे कांही सहकारी होते. ही गाऱ्हाणीं टिळकांच्या कानावर घालण्याचेहि प्रयत्न वारंवार होत. ही भुणभूण बरेच वेळा माझ्या कानावर आली तेव्हा मी देखील जरा कंटाळलोंच ! मी बळवंतरावांकडे राजीनामा पाठवून दिला. पण, मी संस्था सोडून जाणार ही कल्पना त्यांना अगदी असह्य वाटली.</br> {{gap}}प्रश्न -- हा विषय ओघानेंच आला आहे म्हणून अेक प्रश्न विचारतों. आपला ' भारतसेवक समाजा' कडे ओढा होता असें कांही लोक समजतात तें खरें का ?</br> {{gap}}अुत्तर - हा समज कसा उद्भवला व पसरला याचें मला नेहमी आश्चर्य वाटतें. टिळकांच्याबद्दल जशी मला आदरबुद्धि वाटे तशीच गोखल्यांबद्दलहि वाटे. यामुळे हा समज फैलावला असावा !</br> {{gap}}प्रश्न--सर्व्हंट ऑफ अिंडिया सोसायटींत घेतलेला आपला अेक फोटो आहे त्याची अुपपत्ति काय ?{{nop}}<noinclude></noinclude> du1uvrp70d6vtmvw6elroiqvbkwu05x पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५४ 104 103412 233037 209888 2026-07-10T15:17:52Z कल्पनाशक्ती 3813 233037 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१४७}} {{rule}}</noinclude>{{gap}}अुत्तर--ठीक विचारलेंत ! नेव्हिन्सन्साहेब हिंदुस्थानांत आले ते प्रथम कांहीं दिवस मुंबईस राहिले. पुण्यास येतांना त्यांनी ओळखीचें पत्र Introductory Letter आणलें तें टिळकांनाहि आणलें नाहीं व गोखल्यांनाहि आणिलें नाहीं; तें आणलें मला! त्यामुळे मला त्यांच्याबरोबर चार ठिकाणी जाणेंच होतें. ते व मी सर्व्हंट ऑफ इंडिया सोसायटींत गेलों असता सर्वांचा फोटो घेण्यांत आला. याखेरीज त्या फोटोचा कांही अर्थ नाही.</br> {{gap}}प्रश्न-- आपण आजवर इंग्रजी व मराठी लेख पुष्कळ लिहिले. सहज फटकावून टाकिलेले पण छान साधलेले असे कांही लेख आपल्या स्मरणांत असतीलच ?</br> {{gap}}अुत्तर -- असा अेक अिंग्रजी लेख माझ्या चांगल्या स्मरणांत आहे. महात्माजींवर १९२२ सालीं खटला झाला. त्या खटल्याची चौकशी अहमदाबादेस झाली तेव्हां मी तेथें हजर होतों. श्री. महादेव देसाअी यांनी या प्रसंगावर लेख लिहिण्याबद्दल अनेकांना सांगितलें; त्यांत मलाहि सांगितलें. कबूल केल्याप्रमाणें मी लेख धाडून दिला. अितर कित्येकांप्रमाणे मी गांधींचा 'भक्त' नसूनहि गांधींवरील या प्रसंगाचे मी अितकें मार्मिक व हृदयंगम वर्णन करूं शकलों याबद्दल महादेवभाअींनी आश्चर्य व्यक्त केलें. </br> {{gap}}प्रश्न -- असेच कांही मराठी लेख-</br> {{gap}}अुत्तर -- पुष्कळ आहेत. ' बंडखोरीचा बाष्कळ आरोप' हा लेख असा आहे. दिल्ली दरबारावरील लेख व करवीरकर छत्रपतींच्या पत्रव्यवहारा बद्दलचे लेखहि असेच आहेत.</br> {{gap}}प्रश्न -- लिहिण्यासाठी बैठक टिकवून बराच वेळ बसण्याचे प्रसंगहि आपल्यावर पुष्कळ आले असतील ?</br> {{gap}}अुत्तर -- टिळकचरित्र संपवून हातावेगळे करावें यासाठी पांचगणीस जाऊन राहिलों तेव्हा मला बैठक मारून १२।१४ तास बसावें लागे. अेक लेखक पुरा पडणार नाही हें आगाअू ओळखून मी दोन लेखक बरोबर घेतले होते.{{nop}}<noinclude></noinclude> nf22foyetia0o4vegrnnut8jnkyw3wv पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५६ 104 103491 233038 209890 2026-07-10T15:18:57Z कल्पनाशक्ती 3813 233038 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ १४९}} {{rule}}</noinclude>गोष्ट अशी की, कधीहि डोकें दुखल्याचेंहि मला आठवत नाही याचीं कारणेंच हुडकून काढावयाचीं तर मी असें म्हणेन की, नियमित राहणी. मनःसमाधान व वृत्तीची प्रसन्नता ( Equanimity of mind) यामुळेच माझें आरोग्य टिकलें आहे.</br> {{gap}}प्रश्न- लोकमान्यांचें जसें सुपारीवांचून चालत नसे--</br> {{gap}}अुत्तर - तसें माझ्या बाबतींत कांही नाही. जेवल्यावर रुचिपालट करण्यासाठी थोडी सुपारी तोंडांत टाकितों अितकेच; मध्यंतरी एकदा असें वाटू लागलें होतें की, आपल्याला तपकिरीची संवय जडणार. थोडे दिवस मी जवळ डबीहि बाळगीत असें; पण तपकिरहि लवकरच सुटली. असेंब्लीच्या बैठकींना जात असें तेव्हा थंडीच्या कडाक्यामुळे अगर शिष्टाचाराच्या प्रभावामुळे सिगारेटदेखील कधीकधी ओढीत असें. पण, सिगारेटचें 'व्यसन' असें लागलें नाही. नर्मदा ओलांडन खालीं दक्षिणेकडे आलों म्हणजे मला कशाची आठवणहि होत नसे !</br> {{gap}}प्रश्न -- आपली अीश्वरविषयक बुद्धि काय प्रकारची आहे ?</br> {{gap}}अुत्तर -- माझ्या ठिकाणी अीश्वराविषयी आस्तिक्यबुद्धि आहे. या सृष्टीचा कोणीतरी निर्माता आहे हें माझ्या बुद्धीला पटतें; पण, Personal God वर मात्र माझा विश्वास नाही त्यामुळे, नवससायास अगर व्रतवैकल्यें यांच्या नादी मी केव्हाच लागलों नाही.</br> {{gap}}प्रश्न -- आपण दैववादी आहांत असें कांही लोक मानितात तें खरें का ?</br> {{gap}}अुत्तर --- या बाबतींत माझी काय वृत्ति आहे हें अेका शब्दांत सांगता येणार नाही. विश्वांत अनंत परिमाणु असतात व त्या प्रत्येक परिमाणूंत कांही शक्ति असते. समाजाचें तसेंच आहे. दैववादी म्हणजे दैवावर विसंबून राहून प्रयत्नाला पारखा होणारा असा अर्थ मानिला तर मी दैववादी नाही. मी आपल्या परीने जास्तींत जास्त प्रयत्न केल्याशिवाय रहाणार नाही. पण, माझ्यासारखेच इतर घटकहि प्रयत्न करीत असतात ह्याची मला नेहमी जाणीव असते. अितर घटक मजपेक्षा अधिक प्रभावी ठरले तर मी<noinclude></noinclude> m2rc8y9kulavusz38clgrze5601xltn पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५७ 104 103492 233039 209891 2026-07-10T15:19:35Z कल्पनाशक्ती 3813 233039 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१५०]}}{{right|[माझा जन्मभरचा}} {{rule}}</noinclude>त्यांचा प्रभाव मान्य करीन. याअर्थी मी दैववादी आहें. अशा तऱ्हेचा दैववाद माझ्या ठिकाणीं दृढावला आहे याचें कारण मला कांहीं प्रसंगीं आलेला अनुभव.</br> {{gap}}प्रश्न -यांपैकी कांही अनुभव सांगण्यासारखे आहेत का ?</br> {{gap}}अुत्तर -- मला कल्पनाहि नसतां मी केसरींत आलों हें नियतिप्रभावाचें अेक अुदाहरण. नाहीतर मी साताऱ्यास वकिली करीत राहिलों असतों अगर जमखंडीसारख्या संस्थानांतील न्यायखात्यांत नोकरींत शिरलों असतों. दुसरें अुदाहरण टिळकांच्या मृत्युपत्राचें हजार भानगडी संभाळून टिळकांनीं मृत्युपत्र लिहिलें हा पहिला विलक्षण योगायोग; लिहिलेलें मृत्युपत्र रद्द करण्याची बुद्धि त्यांना झाली नाही हा दुसरा योगायोग व सर्वांत विलक्षण योगायोग असा की, हें मृत्युपत्र टिळकांच्या खाजगी कागदपत्रांत न राहता तें बाबांच्या ( केसरीचे मॅनेजर श्री. बाबासाहेव विद्वांस ) जवळ राहिलें. या गोष्टी दैववशात् घडल्या नसत्या तर आज केसरी संस्था कोठें असती व तिचें काय झालें असतें याची कल्पना तुम्हाला येअीलच !</br> {{gap}}प्रश्न -- आपल्यावर कौटुंबिक दुःखाचे विशेष खडतर प्रसंग कोणते ओढवले ? अशा प्रसंगी आपण आपलें सांत्वन कसें करून घेतलें ?</br> {{gap}}अुत्तर -- अशा प्रकारचा पहिला प्रसंग म्हणजे माझ्या थोरल्या बंधूंच्या मृत्यूचा. १९०४ सालीं ते वारले तेव्हा त्यांचें वय अवघें ३४-३५ वर्षाचें होतें. त्यांचें मजकडे फार लक्ष असे. मी मोठें व्हावें अशी त्यांची फार प्रबळ अिच्छा. मी एल्एल्. बी. कडे गेलों तो मुख्यतः त्यांच्याच प्रोत्साहनानें. मुलीवरील वैधव्याचा आघात हा दुसरा दारुण प्रसंग. मनुष्य हा परावलंबी आहे, नियतीपुढे त्याचा नाअिलाज होतो या विचाराने अशा प्रसंगीं माझें सांत्वन झालें आहे. पण, हे प्रसंग टाळण्याचा आपल्याकडून होण्यासारखा कांही प्रयत्न व्हावयाचा राहिला तर मात्र नियतीला दोष देण्याला माझें मन धजणार नाही. अशा चुकीमुळे माझ्या मनाला कायमची रुखरुख लागून राहील ! कांही केलें व कितीहि काळ गेला तरी ही रुखरुख नाहीशी होणार नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> gq6ozy84ig0r4055cd0j08o54pn8v3m पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१५८ 104 103493 233040 209892 2026-07-10T15:20:20Z कल्पनाशक्ती 3813 233040 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१५१}} {{rule}}</noinclude>{{gap}}प्रश्न -- आपण बी. अे. मध्ये असतांना मराठी लिहिण्याला कांही फॉर्म द्यावा असें आपल्याला वाटू लागलें. आपली ही कल्पना थोडी खुलासेवार सांगाल तर बरें.</br> {{gap}}अुत्तर - जें वाचलें असतां आनंददायक ठरेल असें कांही लिहावें अितकीच माझी कल्पना होती. जें लिहावयाचें तें भाषांतरित असो, रूपांतरित असो अगर स्वतंत्र असो, तें आनंददायक व्हावें अशी महत्त्वाकांक्षा माझ्या मनांत त्या वेळी प्रादुर्भूत झाली.</br> {{gap}}प्रश्न--आपल्या लेखनामुळे मराठींतील निबंधरचनेला अेक प्रकारचें वळण लागलें, नव्हे ?</br> {{gap}}अुत्तर -- हें लोकांनी ठरवावयाचें आहे. पण अवढे बरीक खरे कीं, कोणत्याहि विषयावर लिहितांना त्या विषयाची समग्र माहिती गोळा करून त्या विषयाची साधकबाधक चर्चा करावी अशी मला मुळचीच आवड. ' त्यामुळे मी कांही लिहिलें तरी त्याला निबंधाचे स्वरूप सहज येतें. माझ्या पुष्कळशा व्याख्यानांचीं लिहिलेलीं टिपणें माझ्या संग्रहाला आहेत. त्यांचा कोणी विस्तार केला तर त्यांतून चांगले भरघोस निबंध तयार होतील असें मला वाटतें.</br> {{gap}}प्रश्न -- या दृष्टीनें टिळकांच्या लेखनांचें कांहीं वैशिष्ट्य होतें का ?</br> {{gap}}अुत्तर - टिळकांचें मन आवेशयुक्त असल्यामुळे त्यांचें वर्तमान-पत्रांतलें बहुतेक लिहिणें Propagandist स्वरूपाचें असे. माझ्या वर्तमान-पत्रांतल्या लिहिण्यालाहि निबंधाचा घाट येतो; टिळकांचें लिहिणें ' आर्टिकल' च्या स्वरूपाचें असे.</br> {{gap}}प्रश्न - केसरीत आपण कांही नवीन लेखनप्रकार सुरू केले का ?</br> {{gap}}अुत्तर--' रजःकण' या नांवाचें सदर मी बरेच वर्षांपूर्वीं सुरू केलें होतें. 'प्रासंगिक बोल' हैं सदर १९२० च्या सुमारास सुरू झालें त्यालाहि माझी संमति होती. या सदरांत एकदोन कॉलम विनोदी, गमतीदार मजकूर देता आला तर मला पाहिजे आहें. आणखीहि लेखनप्रकार सुचवितां येतील; पण ते सुरू केल्यावर त्यांची भरतीहि मीच करीन म्हटलें तर तें शक्य नाही.{{nop}}<noinclude></noinclude> j8g752rjrkf4k8x5ka4z5bg10vcao75 पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१६३ 104 103614 233041 209897 2026-07-10T15:21:15Z कल्पनाशक्ती 3813 233041 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१५६]}}{{right|[माझा जन्मभरचा}} {{rule}}</noinclude>स्वातंत्र्यावर भर देत असत; टिळक स्वदेशीसाठी तळमळत तर परांजपे बहिष्काराखेरीज भाषा बोलत नसत.</br> {{gap}}प्रश्न -- असे मूलभूत मतभेद असूनहि हा पक्ष इतके दिवस टिकला हेंच आश्चर्य समजावयाचें की काय ?</br> {{gap}}अुत्तर -- त्यांतहि फारसें आश्चर्य मानण्याचें कारण नाही. टिळकांच्या पॉलिटिक्सकडे स्थूलमानाने पाहिल्यास असें दिसेल की, टिळकांचेंं राजकारण हें निदान १९१९ पर्यंत तरी प्रायः अव्यक्त स्वरूपाचें होतें. पक्षांतल्या लोकांच्या पोटांतले मतभेद प्रगट व्हावयाचे तर राजकारण व्यक्त स्वरूपाचें (Politics of Details) असावें लागतें. अशा व्यक्त स्वरूपाच्या राजकारणाला काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीच्या मॅनिफेस्टोने नुकतीच सुरवात झाली होती. या मॅनिफेस्टोप्रमाणे कांही वर्षे काम करून सुधारणा राबवून जी पक्षसंघटना टिकली असती तीच पक्षसंघटना खरी टिकाअू म्हणतां आली असती.</br> {{gap}}प्रश्न -- बुद्धियोगी महाराष्ट्र- पुढाऱ्यांना गांधींच्या श्रद्धायोगांत खरोखर काय वावगें दिसतें ?</br> {{gap}}अुत्तर -- गांधी भलत्याच मुद्द्यांवर ( False issues ) लढा चालवितात व भलत्याच मुद्द्यांवर समेट करतात. गांधींचें Suffering चें अगर कायक्लेशाचें तत्त्वज्ञान अुदात्त खरें; पण नुसत्या Suffering च्या आधारावर राजकीय पक्षांची टिकाअूं संघटना होअू शकत नाही हें विसरून चालणार नाही.</br> {{gap}}प्रश्न --- गांधींच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त अेखादा कार्यक्रम कोणी आखल्यास तो लोकांना पटेल का ?</br> अुत्तर -- मला असें वाटत नाही. रान अुठविण्याच्या गांधींच्या कार्यक्रमापुढे कोणताहि विधायक कार्यक्रम फिक्काच पडेल. आजच्या मितीस कोणतीही चळवळ करावयाची तर ती लोकांना आकर्षक वाटली पाहिजे, लोकांच्या कल्पनाशक्तीला दिपविण्याचें व लोकांना तुरुंगाच्या मार्गाला लावण्याचें सामर्थ्य ज्या चळवळींत नाही ती चळवळ आज लोकांना मान्य होणार नाही.{{nop}}<noinclude></noinclude> fk4q3g64q4av4ym0jow6w491v5plwo6 पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१६६ 104 103644 233042 209900 2026-07-10T15:21:51Z कल्पनाशक्ती 3813 233042 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ १५९}} {{rule}}</noinclude>टाळता आल्यास महाराष्ट्राची कामगिरी निःसंशय भरीव प्रकारची होअील यांत शंका नाही. हा दुर्गुण आपल्याप्रमाणे बंगाली लोकांतहि थोडाफार दिसून येतो.</br> {{gap}}प्रश्न -- आपल्या अगदी आवडीच्या अशा अेकाद्या धर्मग्रंथाचें नांव सांगाल काय ? आपण एकादा आचार अगदी निष्ठेने रोज पाळता काय ?</br> {{gap}}अुत्तर -- खरें म्हणाल तर असें कांही सांगतां येणार नाही. मी हिंदु खरा; परंतु अमुक अेका धर्मग्रंथांतील तत्त्वें मी मानतों असें म्हणणें बरोबर होणार नाही. निसर्गाच्या स्वरूपाचें व नियमांचें जें योग्य स्पष्टीकरण भौतिक शास्त्रांच्या पुराव्यावरून माझ्या बुद्धीला वाटते तेंच खरोखर मी अीश्वरस्वरूप मानतों. सृष्टिवर्माचे स्वाभाविक परिणाम होतील ते आचारांत आणणें जितकें शक्य असेल तितके आणण्याचा मी प्रयत्न करतों. तथापि याचा अर्थ मी घरांतील कुलाचार सोडले आहेत असें मुळीच नाही. वडिलांचे श्राद्धपक्ष, श्रावणी अित्यादि नित्याचीं कर्मे मनापासून करतों. अहो, कांहीं सुधारकांची गम्मत अशी पहा की, ते वडिलांचें श्राद्ध करीत नाहींत ; त्यास हसतात. पण ' अॅनिव्हर्सरी' मात्र करतात ! मग त्यापेक्षा चांगलें श्राद्ध कां करीत नाहीत ? आमच्या घरांत वडिलांच्या वेळेपासून रामाचा उत्सव होत असतो. मी तो मोठ्या हौसेने करीत आलों आहें व हे कुलाचार टिकवावे व चालवावे असें माझें मत आहे. मला समाजांत व कुटुंबांत राहावयाचें आहे व माझ्याबरोबर त्यांनाहि पुढे न्यावयाचें आहे. यासाठी जरूर त्या सर्व गोष्टी करणें मी आवश्यक मानतों.</br> {{gap}}आतां नित्याच्या आचारासंबंधाने म्हणाल तर असें सांगतों की, मी रोज स्नान करतों व देवासमोर बसून गंध लावण्यापूर्वीं एक मिनिट का होईना निर्ध्यान होण्याचा प्रयत्न करतों. रोज हें साधतेंच असें नाही. पण मनांत कोणताही विचार किंवा कल्पना न येऊं देतां किंवा मूर्तीचें ध्यान न करतां निर्ध्यान अवस्थेंत एकादें मिनिट गेलें तरी तें मला फार फायदेशीर वाटतें व नंतर देवाला चार फुलें वाहतों. हा आचार बहुतेक नियमाने पाळीत आलों आहे.{{nop}}<noinclude></noinclude> llw6cimx5wi9yixxrdxxl07bd2touab पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१६८ 104 103646 233043 209902 2026-07-10T15:22:56Z कल्पनाशक्ती 3813 233043 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ १६१}} {{rule}}</noinclude>नाही. कवितांचेंहि तसेंच. बाकी त्या मानाने मी बाहेर फारसें कुठे लिहिलेंच नाही. जें लिहिलें तें लोकांनी आग्रहपूर्वक मागून नेऊन छापलें.</br> {{gap}}प्रश्न - बरें पुढे ?</br> {{gap}}अुत्तर - दुसरें असें की, मला आयुष्यभर गृहसौख्य अगदी पूर्णपणें मिळालें. अेक दोन दुःखकारक गोष्टी घडल्या, नाही असें नाही; अेकमुलीवरील वैधव्याचा प्रसंग व दुसरा वडील बंधु नारायणराव यांचा मृत्यु. अशा गोष्टी दुर्दैवाने व्हायच्याच. परंतु अेकंदरींत माझें हें आयुष्य अत्यंत सुखकारक गेलें असें म्हणायला कांही हरकत नाही. सांपत्तिक दृष्टीने पहिलीं १८|१९ वर्षेंपर्यंत स्वार्थत्यागाचा चिमटा थोडा फार बसत होता; पण पुढील आयुष्यांत त्या दृष्टीनें तक्रार करण्यास फारशी जागा राहिली नाही. पहिल्यापासून माझा कटाक्ष असे की, कांही झालें तरी कर्ज म्हणून काढायचें नाही. त्यामुळे जमाखर्चाच्या दोन्ही तोंडांची मिळवणी करणें प्रारंभी कठीण जात असे. तसा मी कांहीं छानछोकीच्या राहणीचा मनुष्य नाही. माझी राहणी अगदी साधी आहे. तथापि तशाहि स्थितींत प्रथम स्वार्थत्याग जाणवत असे. पण पुढे कांही तशी स्थिति राहिली नाही. त्यामुळे माझें आयुष्य अेकंदरींत 'खाऊन पिऊन सुखी' अशा प्रकारें गेलें असें म्हणण्यास हरकत नाही. </br> {{gap}}प्रश्न--वाङ्मयलेखनांत आपणांस प्रारंभापासून आतांपर्यंत किती अर्थप्राप्ति झाली ?</br> {{gap}}अुत्तर -- वाङ्मयलेखनापासून मला आतांपर्यंत कमीत कमी ३०,००० रुपये मिळाले असें म्हणायला हरकत नाही.</br> {{gap}}प्रश्न – साधारणतः कोणत्या पुस्तकांबद्दल किती, तसेंच केव्हांपासून पैसे मिळवायला सुरुवात झाली, स्फुट लेखनाबद्दल कांही मिळालें काय त्याची माहिती हवी.</br> {{gap}}अुत्तर -- साधारणपणे सन १९१२ पासून मला पुस्तकांपासून प्राप्ति व्हायला लागली. माझ्या कांही पुस्तकांच्या दोनदोन तीनतीन आवृत्त्या निघाल्या आहेत. तें सर्व धरून ठोकळमानाने असें म्हणता येईल की, नाटकें,<noinclude><br>{{gap}}मा. ज. अु. ११</noinclude> 4tamscgd4dqydlzd2rgji0093ynu4ig पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१७१ 104 103670 233044 209905 2026-07-10T15:23:42Z कल्पनाशक्ती 3813 233044 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१६४]}}{{right|[माझा जन्मभरचा}} {{rule}}</noinclude>तो काय मागतो तें लोकांना चट्कन् कळतें व पटतें आणि सरकारला तर तें द्यायचें नसतें. परंतु लोकक्षोभाच्या भीतीने कांही ना कांही तरी त्यांना द्यावेंच लागतें. टिळकांची ही जी राजकारणविषयक व्यावहारिक दृष्टि ती मी त्यांच्यापासून शिकलों. अर्थांत् त्यांनीं जीं साधनें निर्माण केलीं त्यांचा मात्र मला पुष्कळ अुपयोग झाला यांत शंका नाही.</br> {{gap}}प्रश्न -- आपलें थिऑसफिस्ट' संबंधानें काय मत आहे ? आपण स्वतः कधी थिऑसफिस्ट झालां होतां काय ?</br> {{gap}}अुत्तर - मी कधीच थिऑसॉफिस्ट झालों नाही. थिऑसफीबद्दल माझें चांगलें मत आहे. थिऑसफीनें हिंदुधर्माला फार मोठी मदत केली आहे. परक्या लोकांनी आमच्या धर्मावर, चालीरीतींवर व संस्कृतीवर जे आक्षेप घेतले होते त्यांना त्यांच्या जातिबांधवांकडून परस्परच अुत्तरें मिळत गेलीं व त्यामुळे हिंदुधर्माविषयीं चांगल्या कल्पना पाश्चात्य लोकांत प्रसृत होण्यास मदत झाली. या दृष्टीने हिंदु लोकांना तो पंथ पसंत पडला. बरें, त्यांत कांही नवीन होतें असें नाही. कांही स्वतंत्र असें धर्मखातें किंवा धर्ममतें त्यांनी निर्माण केलीं असें नाही. त्यांचें ध्येयच हिंदूचा चांगला हिंदु, मुसलमानाचा चांगला मुसलमान, ख्रिस्त्याचा चांगला ख्रिस्ती करण्याचें होतें. त्यामुळे विरोधाचें कारणच नाही. अुलट त्यांनी निरनिराळ्या धर्ममतांबद्दल अेक प्रकारचे सहिष्णुतेचें वातावरण निर्माण करण्यास मदत केली आहे.</br> {{gap}}प्रश्न- हिंदुधर्माविषयीं अभिमान बाळगून जगभर त्याचा प्रसार व्हावा असा आपण प्रयत्न करणें जरुरीचें आहे असेें आपणास वाटत नाही काय ?</br> {{gap}}अुत्तर -- खरें सांगूं? मी अेकांतिक अभिमान कशाचाच धरीत नाही. मी हिंदु कुटुंबांत जन्मलों म्हणून हिंदुधर्माचा अभिमान धरायचा हें ठीक; पण मुसलमान कुटुंबांत जन्मलो असतों तर मुसलमानधर्माचा धरला असता. ख्रिस्ती कुटुंबांत जन्मतों तर ख्रिस्तीधर्माचा धरला असता. हें स्वाभाविक नव्हे काय ? अमुक अेका धर्माचा अभिमान अेका विशिष्ट मर्यादेपलीकडे जातां कामा नये. अभिमान धरायचा असेल तर तो प्रत्येक धर्मांतील बुद्धीला पटणाऱ्या अशा ज्या गोष्टी असतील त्यांचाच धरला पाहिजे.{{nop}}<noinclude></noinclude> 6owc78mejax2j82nnghddnbs323yvok पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१७३ 104 103672 233045 209907 2026-07-10T15:24:52Z कल्पनाशक्ती 3813 233045 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१६६]}}{{right|[माझा जन्मभरचा}} {{rule}}</noinclude>पाहिलें तर चांगले १०-१५ लाख रुपये पाहिजेत. तेव्हां त्यांच्या बुडाशीं असलेली कल्पना यशस्वी होईल, त्याशिवाय नाही.<br> {{gap}}पण टिळकांच्या हयातींत त्यांना अशी संस्था काढण्याबद्दल पुष्कळांनी सुचविलें. त्यांना टिळकांनी जें उत्तर दिलें तेंच मलाहि मान्य आहे. अेक तर शपथ घेअून अेकाद्या संस्थेला कायमचें बांधून घेण्याने काम योग्य प्रकारें होअील अशी त्यांची कल्पना नव्हती. प्रथम प्रथम जेसुईट पंथाच्या रचनेबद्दल व कार्यपद्धतीबद्दल त्यांना फार आदर वाटत असे व त्या धर्तीवर महाराष्ट्रांत कार्य व्हावें असें त्यांना वाटत होतें. परंतु या बाबतींत त्यांना जो प्रत्यक्ष अनुभव डेक्कन अेज्युकेशन सोसायटींत असतांना आला त्यावरून त्यांचीं यासंबंधींचीं मतें पुढे बदलली. कायम वाहून घेण्यानें लग्नाच्या बायकोसारखी स्थिति होते. एकदा लग्न झालें, कीं, त्या नवऱ्याशीं बायकोला व त्या बायकोशी नवऱ्याला कसल्याहि परिस्थितींत संसार करावाच लागतो. घटस्फोट शक्य होत नाही. त्यांत दोघांनाहि शेवटी वाीअटपणाच पदरीं घ्यावा लागतो. त्यापेक्षा कार्यानिमित्त स्वखुषीनें होणारें सहकार्य अधिक अिष्ट. वरील प्रकारांत अेखाद्या मनुष्याचें व आपलें पटलें नाही तर त्याला काढणें जिवावर येतें. कारण त्यानें स्वार्थत्याग केलेला असतो व कष्टहि सोसलेले असतात; बरें ठेवावा तर कार्य सुरळीत चालत नाहीं म्हणून अनुभवान्ती ही कायमचें वाहून घेण्याची योजना मला त्याज्य वाटते. दुसरी पद्धत बिनधोक्याची आहे. अकमेकांचें जमतें तोंपर्यंत सहकार्यं; 'नाही त्या दिवशीं एकमेकांना आपला स्वतंत्र मार्ग मोकळाच आहे.</br> '''भावी महाराष्ट्र विद्यापीठ'''</br> {{gap}}प्रश्न - नवीन होअू घातलेल्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटीसंबंधाने आपलें म्हणणें काय आहे ?</br> {{gap}}अुत्तर - या बाबतींत माझें असें म्हणणें आहे की, आतां महाराष्ट्र युनिव्हर्सिटी होणें अपरिहार्य आहे. हिंदुस्थानला प्रांतिक स्वायत्तता मिळाली, की महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचा हा प्रश्न धसास लागेल. कांही झालें तरी प्राथमिक, माध्यमिक आणि अुच्च असें सर्वच्या सर्व शिक्षण मातृभाषेंतूनच झाले पाहिजे असें माझें मत आहे. त्याशिवाय लोकशाहीची खरी वाढ<noinclude></noinclude> d43v0wpn8tq02c4zat1l02zdwrp7tlc पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१७४ 104 103673 233046 209908 2026-07-10T15:26:39Z कल्पनाशक्ती 3813 233046 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१६७}} {{rule}}</noinclude>होणार नाही आपल्या महाराष्ट्राची जी विशिष्ट संस्कृति आहे ती अगदी खालच्या थरापर्यंत जाऊन पोंचली पाहिजे व त्यासाठी निरनिराळ्या विषयावर निरनिराळ्या दर्जाचीं लहान-मोठीं अनेक पुस्तकें झालीं पाहिजेत. त्याशिवाय समाजाचा नैतिक दर्जा वाढणार नाही. हें पुस्तकलेखनाचें व प्रकाशनाचें काम मोठ्या प्रमाणावर चालण्यास युनिव्हर्सिटीच पाहिजे. अेरवी तें होणार नाही.</br> {{gap}}प्रांतिक स्वायत्तता मिळाली, की गुजराथी लोक अगोदर आपली युनिव्हर्सिटी बनवितील. त्यांना अहमदाबाद, सुरत, बडोदे, काठेवाड (भावनगर, जुनागड, राजकोट वगैरे) अित्यादी तयार केन्द्रे आहेतच. त्यांच्या बाबतींत पैशाचा प्रश्न नाही. त्यांची तशी अिच्छाही पण आहे. अर्थात् अनुकूल संधि मिळतांच गुजराथ युनिव्हर्सिटी स्थापन होण्यास अुशीर लागणार नाही.</br> {{gap}}गुजराथच्या मागोमाग कर्नाटक, कर्नाटक अेकीकरणाचा प्रश्न धसास लागलेलाच आहे. कदाचित् म्हैसूर युनिव्हर्सिटी हीच कर्नाटकाला अभिप्रेत युनिव्हर्सिटी होअील. नाही कोणी म्हणावें ?</br> {{gap}}राहतां राहिला प्रश्न महाराष्ट्र युनिव्हर्सिटीचा. ती आपली सर्वांच्या शेवटीं होणार. मुंबई युनिव्हर्सिटी ही सार्वजातीय (Cosmopolitan) आहे. ती मुंबअीपुरतीच राहील शेवटीं (Unitary and Teaching university) अेकमुखी व शैक्षणिक युनिव्हर्सिटीचें स्वरूप तिला प्राप्त होणार असाच अेकंदरींत रंग दिसतो.</br> {{gap}}महाराष्ट्रापुढें पैशाचा मोठा प्रश्न आहे. शिवाय आपसांतील भांडणें आहेतच. परंतु युनिव्हर्सिटी होअूं घातली म्हणजे पैसाहि अुभा राहील व मतभेदहि वितळून जाअून त्यांतून माग निघेल. पुणें जरी अेकमुखी युनिव्हर्सिटीला अनुकूल किंवा सोअिस्कार असलें तरी प्रारंभी तरी निदान ती संयोजक (Affiliating) युनिव्हर्सिटीच राहील. किंबहुना अध्यापन व परीक्षा अशीं तिचीं दोन स्वतंत्र अंगें कायमच राहतील असें दिसतें. प्रांतिक स्वायत्तता मिळाली तर अनुकूल प्रसंग पाहून महाराष्ट्र-युनिव्हर्सिटी-बिल त्यांत आणून तें पास करून घेणें शक्य होअील. सध्या जरी सरकारी मदतीचा<noinclude></noinclude> ij89v3z5lo4scc8e8j1nyosoq8504f4 पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१७६ 104 103675 233047 209910 2026-07-10T15:28:12Z कल्पनाशक्ती 3813 233047 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ १६९}} {{rule}}</noinclude>चिरकालिक असतें हें मला निरनिराळ्या शास्त्रांच्या परिशीलनाने सोपपत्तिक दाखवावयाचें आहे, त्याचप्रमाणें प्रगतीची गति ही सातत्याची असते (Continuous) की क्रिया-प्रतिक्रियेची (Action and Reaction) असते हेंहि त्यांत विस्तारपूर्वक दाखवावयाचें आहे. अशा कांही कल्पना आहेत; पण आज सगळ्या विचाराच्याच अवस्थेत असल्यामुळे यापेक्षा निश्चयात्मक सांगतां येत नाही ! परंतु याच्या आधी मला एक-दोन कादंबऱ्या लिहायच्या आहेत. वाङमयाचा तो एक प्रकार असा आहे की त्या प्रांतांत मी अद्यापि पाऊल टाकलें नाही. तेव्हा एक-दोन कादंबऱ्या लिहिण्याची इच्छा आहे व सवड सापडतांच अगोदर तें काम हाती घ्यायचें आहे. माझें शेवटचें पुस्तक म्हणजे माझें 'आत्मचरित्र '.</br> {{right|रत्नाकर, ऑगष्ट १९३२}}</br> {{center|—⋅ːɔ;*:Сːо—}}</br> {{center|'''{{larger|( ३ )}}'''}} </br> {{gap}}प्रश्न - वक्ता जन्मसिद्ध असतो की यत्नसिद्ध असतो ?</br> {{gap}}अुत्तर - वक्तृत्व हें दोन-तीन प्रकारचें असतें. त्यांतील अेक प्रकारचा वक्ता हा जन्मसिद्धच असतो, तो यत्नाने तयार होत नाही. दुसऱ्या प्रकारचा वक्ता हा प्रयत्नाने व अनुभवाने तयार होअू शकतो. म्हणजे भावनाप्रधान व नाटकी वक्ता हा जन्मसिद्ध असतो, आणि विषयप्रतिपादनाने वक्तृत्व अुमटविणारा वक्ता हा प्रयत्नाने तयार होतो.</br> {{gap}}प्रश्न--जन्मसिद्ध वक्तृत्वकलेच्या गुणविकासासाठीं मनुष्याने कोणत्या दिशेनें प्रयत्न करावा ?</br> {{gap}}अुत्तर -- अुपजत वक्तृत्व अंगीं असलें तरी मनुष्याने बहुश्रुतता मिळवावी; म्हणजे त्या जन्मसिद्ध वक्तृत्वगुणाचें चीज होअील. कांही तरी सांगण्यासारखें महत्त्वाचें असल्याशिवाय नुसतें वक्तृत्व वाहावत जातें व हास्यास्पद होतें.</br> {{gap}}प्रश्न - वक्तृत्वकला शिकविता येअील काय ?{{nop}}<noinclude></noinclude> esvnk9omvz5r1nzs91f334j7bj4tgli पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१८१ 104 103756 233048 209915 2026-07-10T15:29:19Z कल्पनाशक्ती 3813 233048 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|१७४]}}{{right|[माझा जन्मभरचा}} {{rule}}</noinclude>तेची जाणीव असती तर मी आहें याहून अधिक चांगला वक्ता झालों असतों. मी स्वतःला हास्यास्पद करून घेतल्याची जाणीव नसेल तर मी अधिक चांगलें बोलेन. माझी स्मरणशक्ति फार वाईट आहे. यामुळे मला मुद्दयाचीं टिपणें करावीं लागतात; आणि तशीं न केल्यामुळे जर योग्य शब्द किंवा युक्तिवादाला अवश्य असा दुवा आठवला नाहीं तर माझें बोलणें फिकें पडतें. लिहिण्याची फार संवय झाल्याने गाडीचें चाक खोल चाकोरींत जाऊन बसावें तशी माझी स्थिति झाली आहे. पण अुलट पुष्कळ नामांकित वक्ते हातांत लेखणी पडल्याबरोबर दिङ्मूढ कसे होतात, व बोलण्याच्या निम्मेहि स्वारस्य त्यांच्या लेखनांत अुतरत नाहीं, हेंहि मीं पाहिलें आहे. म्हणजे अेकाला अेक आहे तर दुसरें नाही. लिहिणें व बोलणें दोन्ही गोष्टी सारख्याच सौष्ठवानें करणारा मनुष्य ववचितच आढळतो.</br> {{gap}}प्रश्न -- शाळेंतील व कॉलेजांतील होतकरू तरुण वक्त्यास विशेषतः सांगण्यासारख्या कोणत्या सूचना आपणांस करतां येतील !</br> {{gap}}अुत्तर - तरुण विद्यार्थ्यांना मी अितकाच अुपदेश करीन की, त्यांनी खूप वाचावें, बहुश्रुत व्हावें व बोलण्याचा प्रत्येक प्रसंग मिळेल तो विचार करून बोलून साधावा. म्हणजे दुसऱ्या कोणाला न विचारतांहि त्यांच्यांत वक्तृत्वाचे गुण कोणते आहेत हें त्यांचे त्यांना कळून होअील. पुढे येणारे दिवस पूर्वीपेक्षाहि वक्तृत्वाला अधिक वाव देणारे असणार यांत शंका नाही. तेव्हा त्यांनी आपल्या गुणांचा भरपूर अुपयोग करण्याची तयारी ठेवावी.</br> {{right|-- किर्लोस्कर, सप्टेंबर १९३२}} {{center|—⋅ːɔ;*:Сːо—}} {{center|'''( ४ )'''}} {{gap}}प्रश्न -- आपल्या ६० वर्षाच्या आयुष्याचें सिंहावलोकन करतांना आपल्या दृष्टीपुढे अनेक बरे-वाअीट प्रसंग अभे रहात असतील. ते लक्षांत घेअून सार्वजनिक कार्य करू अिच्छिणाऱ्या तरुणाला आपण सावधगिरीच्या कोणत्या सूचना करू शकाल ?{{nop}}<noinclude></noinclude> gai7e6nfhbl746zpyr58umr9fo4ceea पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१८२ 104 103788 233049 209916 2026-07-10T15:29:47Z कल्पनाशक्ती 3813 233049 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ १७५}} {{rule}}</noinclude>{{gap}}अुत्तर - सार्वजनिक कार्य करू अिच्छिणाराने प्रथम स्वावलंबी होण्याचा प्रयत्नं केला पाहिजे. स्वाभिमान न गमावतां स्वतःची अुपजीविका त्याला करतां आली पाहिजे. सार्वजनिक कार्याकरितां जनतेजवळ भिक्षा मागण्यांत लाज नाही; पण स्वतःच्या अुपजीविकेकरितां देखील लोकांजवळ पैसा मागणें अत्यंत लाजिरवाणें आहे. दरिद्री, मध्यम स्थितींतला किंवा श्रीमान् यांपैकी कोणत्या दर्जाचें आयुष्य आपणास पुढे घालवावयाचें याचा प्रथम मनाशीं निश्चय करून त्याप्रमाणे अुपजीविकेचें साधन प्राप्त करून घेतलें पाहिजे. आपल्यावर जीं जीं माणसें अवलंबून असतील त्यांच्याबद्दलचीं कर्तव्यें बजावणें हें मी प्रत्येकाचें कर्तव्य समजतों.</br> {{gap}}अुपजीविकेच्या साधनांचे सामान्यतः चार प्रकार सांगतां येतील. स्वतंत्र धंदा करून पोट भरणें हा सर्वांत युक्त मार्ग होय. अेकाद्या संस्थेला वाहून घेअून तिची सेवा करीत रहाणें हा दुसरा प्रकार. खाजगी धन्याची नोकरी हा तिसरा प्रकार. ज्याच्या हातून ह्या तिन्ही गोष्टी होणें शक्य नाही, त्याला सरकारी नोकरी हा शेवटचा अुपाय आहे. सरकारी नोकरी करीत असतांहि स्वत्व राखतां येतें, समाजाची व देशाची यथाशक्ति सेवा करतां येते, असे माझें मत आहे.</br> {{gap}}आयुष्याचें कार्य अुचलावयाचें तें आपली नैसर्गिक प्रवृत्ति पाहून अुचलावें. केवळ कीर्तीकरितां भलत्याच कार्याला हात घालणें आत्मघातकीपणाचें आहे.</br> {{gap}}अेकदां अुचललेलें कार्य जन्मभर करीत राहीन अशा प्रतिज्ञेनें ते अुचलावें. अगदीं अशक्यच झालें तर दुसरीकडे वळावें. पण अंगीकृत कार्य होतां होअील तों सोडूं नये. असें करण्यानें त्या त्या कलेंत मनुष्य वाकबगार बनतो व अधिकांत अधिक यशहि मिळू शकतें.</br> {{gap}}बहुश्रुतता किंवा सर्व गोष्टीचें थोडथोडें ज्ञान असणें चांगलें; कारण त्याचा सर्वत्र अुपयोग होतो; हें करूनहि पण विशिष्ट धंद्यांत पूर्ण निष्णात होणें अधिक चांगलें.</br> {{gap}}आपला सार्वजनिक पैशाशी संबंध असेल तेव्हां कोणाहि एकाच व्यक्तीकडे त्याचा संबंध ठेवूं नये. अनेकांकडे ठेवणें श्रेयस्कर असतें.{{nop}}<noinclude></noinclude> 24xut7k6za3dskw8q28zvqyu1rtvqj3 पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१८४ 104 103851 233050 209918 2026-07-10T15:30:45Z कल्पनाशक्ती 3813 233050 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[ १७७}} {{rule}}</noinclude>असतें. Have something to say, it is easily said असें कोल्हापूरचे प्रो. शिवराम बापूजी परांजपे आम्हांला नेहमी सांगत असत. मनांत आणलें तर प्रत्येक माणसाला आपल्या आयुष्यांत निदान एक तरी मनोरंजक पुस्तक लिहितां येण्यासारखें आहे. आमच्या वेळेला दैनिक वर्तमानपत्रांची आतांअितकी वाढ झालेली नव्हती. म्हणून त्या वेळीं अमक विषयांत नैपुण्य (Specialise) मिळविण्याला सवड नसे. सर्वसामान्य विषयांचा अभ्यास करायला सांपडेल तेवढाच. पण आतां दैनिकपत्रें निघाल्यामुळें विशिष्ट शाखेंत नैपुण्य मिळविण्यास पुष्कळ वाव आहे.</br> {{gap}}प्रश्न -- लेखनव्यवसायावर अपजीविका करणें आज महाराष्ट्रांत शक्य आहे काय ?</br> {{gap}}अुत्तर -- मला तसें आज तरी शक्य दिसत नाही. शिक्षणाचा प्रसार नाही म्हणून मागणी नाही; आणि मागणी नाही म्हणून वाङ्मयाला खप नाही. वृत्तपत्रांवर फारच थोड्या माणसांना जगतां येअील. दुय्यम व्यवसाय म्हणून लेखनाचा धंदा पत्करून अुपजीविकेचें साधन वाढवितां येण्यासारखें आहे. लेखनावर चांगले पैसे मिळविल्याचीं अुदाहरणें माझ्या डोळ्यांसमोर आहेत; पण दुसरा व्यवसाय नसता तर केवळ लेखनावरच ते अुपजीविका करूं शकले असते कीं नाही याबद्दल मला जबर संशय आहे. कै. हरीभाअू आपटे यांनी पुष्कळ कादंबऱ्या लिहिल्या व त्या पुढे लोकप्रिय झाल्या; पण अुपजीविकेच्या दृष्टीने त्यांना त्यांपासून विशेष फायदा झाला नाही. कै. वासुदेव गोविंद आपटे यांनी 'आनंद' मासिकावर व बालवाङ्मयावर शेवटी शेवटी अिस्टेट केली; पण आयुष्यांतील पुष्कळसा काल अुपजीविकेकरितां त्यांना अन्य व्यवसाय करावा लागलाच. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना दोन नाटकांवरच काय ते चांगले पैसे मिळाले. पण तेवढ्यावरच त्यांची अुपजीविका चालणें शक्य नव्हतें. वकिलीचा मुख्य व्यवसाय त्यांना करावाच लागला. पांगारकरांनीं बराच धनसंचय केल्यासारखे दिसतें. पण तो केवळ लेखनावरच नव्हे. ज्या पुस्तकांवर त्यांना बहुतेक पैसा मिळाला तीं पुस्तकें स्वातंत्र्याने लिहिलेली नसून अुतारेवजा आहेत आणि जीं पुस्तकें त्यांनी परिश्रमपूर्वक स्वातं-<noinclude></br>{{gap}}मा. ज. अ. १२</noinclude> px1hzjl6rqe3bascek53ay8rwpv79u8 पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१८६ 104 103853 233051 209920 2026-07-10T15:31:33Z कल्पनाशक्ती 3813 233051 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Shurpalimedha" />{{left|अेक अुद्योग ]}}{{right|[१७९}} {{rule}}</noinclude>(६) निबंध - - निबंधमाला (विष्णुशास्त्री चिपळूणकर) (७) विनोद - साहित्यबत्तिशी (श्री. कृ. कोल्हटकर) (८) कादंबरी - पण लक्षांत कोण घेतो ? ( आपटे) (९) संत वाङ्मय - ज्ञानेश्वरी (१०) शास्त्र - भारतीय ज्योतिषशास्त्राचा अितिहास (शं. बा. दीक्षित) .</br> {{gap}}दहा पुस्तकांची मर्यादा किंचित् वाढविण्याची मला परवानगी दिल्यास राजवाडे यांचे संकीर्ण लेख व मृच्छकटिक किंवा शाकुंतल यांची मी निवड करीन. शेवटचीं दोन नाटकें माझ्या दृष्टीने सारख्याच योग्यतेचीं आहेत.</br> {{right|--श्री लोकमान्य ऑगस्ट १९३२}}</br> {{center|—⋅ːɔ;*:Сːо—}}{{nop}}<noinclude></noinclude> nkq2g6efqmfm2fngm3jvxghsraph73d पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४३ 104 110907 233053 232884 2026-07-10T15:53:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233053 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|१११ }}</noinclude>व वाड्यांच्या अवशेषावरून स्पष्टपणे दिसून येतें. आम्ही मदनमहालाचे वरचे मजल्यासमोरील गच्चीवर गेलों. येथून सभोवारचा सुंदर देखावा दृष्टीस पडून या प्रांताच्या सपाटीचें, सुपीकतेचें व त्यांतील पाण्याच्या विपुलतेचें आश्चर्य वाटलें. तसेंच आम्हीं उभे होतों त्या ठिकाणच्या टेकड्यांच्या अर्धवर्तुळाकार रांगेचे व त्यांच्या विलक्षण शिलामय घडणीचेही विलक्षण आश्चर्य वाटलें. या टेकडीवरून '''पिसनहारीचें देऊळ''' (पीठ दळणाऱ्या एका बाईनें बांधलेलें सुंदर देऊळ) स्पष्टपणे दिसत होतें. तसेंच टेंकड्यांवर व त्यांचे आसपास किती तरी तलाव व पूर्वकाळच्या वस्तीचे अवशेष दृष्टिगोचर होत होते. तेव्हां याच टेंकड्यांच्या आश्रयाला पूर्वीची गोंडवण राजांची राजधानी गऱ्हा कां व कशी बांधण्यांत आली होती हे उत्तम तऱ्हेनें कळून आलें. पूर्वीच्या त्या अंदाधुंदीच्या काळांत सपाटीवर राजधानी स्थापन न करितां या दुर्गम व खडकाळ ठिकाणीच राजधानी स्थापन करणें त्या गोंड राजांना सोयीचें व सुरक्षितपणाचें वाटलें असलें पाहिजे.<Br>{{gap}}या गोंड घराण्याचा मूळ पुरुष एका अगदीं सामान्य घराण्यांतील तरुण '''यदुराय''' म्हणून होता. तो '''कालाचुरी''' राजाच्या पदरी लष्करांत नोकर राहिला. त्याने '''नागदेव''' नांवाच्या गोंड सरदाराच्या मुलीशी लग्न करून आपला सामाजिक दर्जा वाढविला व हळू हळू आपले सामर्थ्य व वर्चस्व वाढविलें. मग त्यानें कालाचुरी राजाला पदच्युत करून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केलें. या घराण्यांत अत्यंत प्रतापी राजा '''संग्रामसिंग''' हा सन १४८० मध्ये गादीवर आला. त्यानें बहुतेक सर्व गोंडवन आपल्या ताब्यांत आणलें. तो सन १५४१ मध्यें वारला. त्याचा मुलगा दलपतसिंग हा गादीवर आला. महोबा या राजस्थानांतील एका ठिकाणच्या चंडेल नांवाच्या राजाची '''दुर्गावती''' नांवाची राजकन्या दलपतसिंगाला आवडली. दुर्गावतीलाही दलपतसिंग पसंत पडला. पण चंडेल राजा हीन जातीच्या गोंड घराण्यांतील राजाला आपली मुलगी देण्यास तयार होईना. म्हणून दलपत-<noinclude></noinclude> qrkiimr2fxonmbwphya9w6out8puavi पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४५ 104 110908 233055 232885 2026-07-10T16:02:04Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233055 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|११३ }}</noinclude>क्रमाबद्दल व परोपकारी कृत्याबद्दल लोकामध्यें पूज्यबुद्धि आहे व तिच्या संबंधींच्या दंतकथा समाजामध्यें प्रचलित आहेत. तिची साधी छत्री चबुतरा नांवानें जबलपुरापासून दहा मैलावर दाखविण्यांत येते व त्या चबुतऱ्याचे त्या भागांतील लोक भाविकपणें दर्शन घेतात असें मला सांगण्यांत आलें. मदनमहालाच्या दर्शनानें व तेथून दूरवर दिसणाऱ्या प्रांताच्या गतवैभवाच्या ऐकलेल्या व वाचलेल्या हकीकतीने माझ्या मनांत आश्चर्य व खेद असे परस्पर विरोधी मनोविकार उद्भूत झाले. आम्ही किती वेळ तो सभोवारचा देखावा सखेदाश्चर्यानें पहात होतों हे कळलें नाहीं. पण शेवटीं फार उशीर झाला म्हणून त्या मदनमहालावरून आम्ही दुसऱ्या वाटेने खालीं उतरलों व टेकडीच्या खालच्या मजगीवर असलेलें छोटेसें '''शारदा देवीचे''' देवालय पाहून परत टांगा उभा होता तेथें आलों. मग आम्ही थोडेसें आल्या वाटेने परतून शहराच्या दूरच्या एका भागांतून गुप्तेश्वर नांवाचें महादेवाचें देऊळ पहाण्यास गेलों. हे देऊळ अर्धवर्तुळाकार टेकड्यांच्या दुसऱ्या टोकाला असल्यामुळे आम्हांला टांग्याने बराच वळसा घालून यावें लागलें. बाकी पायवाटेनें व शारदा देवीच्या देवळापासून गुप्तेश्वर हे ठिकाण फार दूर नाहीं असें आम्हांला दिसून आलें. गुप्तेश्वर हे महादेवाचें एक देऊळ असून तें एका मोठ्या खडकाच्या गुहेत बांधलेलें आहे, म्हणून त्याला गुप्तेश्वर असें अन्वर्थक नांव पडलें आहे. येथें देवळाच्या आवारांत विपुल पाण्याची एक विहीर आहे. विहीरीला दगडी पायऱ्या असून पाणी पांच सहा फुटांपेक्षां जास्त खोलीवर नाहीं असें दिसलें. पाण्याचा रंग पांढुरका दिसला. पण हे पाणी फार पाचक व आरोग्यकारक समजलें जातें असें कळलें. देवळाला प्रशस्त अशा फरसबंदी पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही अंगास राहण्यासारख्या ओऱ्या व खोल्या आहेत. गुहेच्या पुढे थोडेसें खुलें पटांगण आहे. येथल्या महादेवापुढचा नंदी बसलेला पाहून मला मोठें नवल वाटलें. हा नंदी त्या खडकांत खोदून तयार केलेला असल्यामुळे कारागिराने बसका नंदी कोरलेला असावा<noinclude></noinclude> dxgtb26c6grln3rp45flc52yzhsyuih पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४४ 104 110909 233054 232886 2026-07-10T15:56:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233054 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११२ |काशी - रामेश्वर यात्रा.|}}</noinclude>सिंगाला चंडेल राजावर स्वारी करून दुर्गावतीला जिंकून तिच्याशी लग्न करावें लागलें. दलपतसिंगानें सातच वर्षे राज्य केलें. दलपतसिंगाच्या मरण समयीं त्याचा व दुर्गावती राणीचा वीरनारायण नांवाचा राजपुत्र केवळ पांच वर्षाचा होता. दुर्गावतीनें बालराजाच्या नांवानें पंधरा वर्षे उत्तम तऱ्हेने राज्यकारभार केला. तिनें आपल्या प्रजेकरितां राज्यांत किती तरी तलाव बांधले. अजून जबलपुरच्या नजीकच्या एका मोठ्या तलावाला '''राणी तलाव''' असें म्हणतात. तसेंच तिनें कितीतरी देवळें व व वाडे बांधले. दुर्गावती राणी फार पराक्रमी व मुत्सद्दी निघाली. पण तिच्या कारकीर्दीमध्यें मोंगल बादशाहीचा अंमल सर्वत्र पसरत चालला. या बादशाहीच्या सुभेदारांपैकीं माणिकपुरचा सुभेदार '''असफशाह''' याला दुर्गावती राणीच्या रूपाचा व तिच्या राज्याचा मोह उत्पन्न झाला व त्यानें दुर्गावती राणीच्या मुलखावर मोठ्या सैन्यानिशीं स्वारी केली व गऱ्हा या राजधानीच्या सभोवार नाकेबंदी केली. दुर्गावती राणी निकरानें लढली व तिनें आपल्या राजधानीचें पुष्कळ काळपर्यंत संरक्षण केलें. राजधानीहून आपल्या राज्यांतील दक्षिणेकडील मंडला नांवाच्या गांवाकडे जाण्याचा तिचा बेत होता. पण असफशहाचा निकराचा हल्ला चालू झाला असतांना गऱ्हा नजीकच्या नदीला पूर आला. दुर्गावती राणी हत्तीवर बसून लढत होती व तिनें हल्ला परतविण्याची शर्थ केली. पण आतां आपण शत्रूचे हातीं जाणार व मग असफशाह जबरीनें आपल्याशीं निका लावील या भीतीनें दुर्गावती राणीनें आत्महत्या करून घेतली! अशी दुर्गावती राणीची मोठी करुण कहाणी मीं गोंडवनाच्या दंतकथात्मक इतिहासाच्या पुस्तकांत वाचली, तेव्हां मला सत्तावन सालच्या बंडांतील झांशीच्या राणीच्या करुणकहाणीची आठवण झाली! दुर्गावती राणीच्या व झांशीच्या राणीच्या कारकीर्दीमध्ये तीनशे वर्षांचा कालावधी आहे खरा; पण दोन्ही राण्यांच्या चरित्रामध्यें किती तरी साम्य आहे असें मला वाटलें. अजून सुद्धां जबलपुरच्या आसपासच्या भागामध्यें या दुर्गावती राणीच्या परा-<noinclude></noinclude> 1q4ifpyj5b5kv278k124s5dui13io0d पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४९ 104 110910 233059 232887 2026-07-10T16:13:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233059 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण १० वें.'''}}}} {{rule|7em}} {{center|'''प्रयाग अथवा अलाहाबाद'''}} {{gap}}{{x-larger|'''धा'''}}र्मिक वाङ्मयांत ज्याप्रमाणें भगवद्गीता, ब्रह्मसूत्रे व दशोपनिषदे यांना प्रस्थानत्रयी म्हणतात; व प्रत्येक धर्मप्रवर्तक आचार्यानें या प्रस्थानत्रयींवर भाष्यें केलींच पाहिजेत अशी प्रथा पडली त्याप्रमाणें धार्मिक यात्रांमध्यें प्रयाग, काशी व गया यांना '''त्रिस्थळी''' यात्रा म्हणतात व भाविक हिंदूनें आयुष्याच्या शेवटल्या पादामध्यें या यात्रा केल्याच पाहिजेत अशी पुरातन काळापासून प्रथा पडली आहे. नुसती ही त्रिस्थळीची यात्रा घडावी येवढेच नव्हे तर गंगायमुनांचे संगमावर आपल्याला मरण येऊन आपल्या अस्थि गंगेत पडून पवित्र व्हाव्या म्हणजे आपल्याला हटकून मोक्षप्राप्ति होते अशी धार्मिक श्रद्धा असल्यामुळें प्रयागच्या संगमावर व काशीच्या ज्ञानवापीत विशेष भाविक यात्रेकरू आपखुषीनें जलसमाधी घेत, तर पुष्कळ लोक वृद्धापकाळीं या पवित्र स्थळी कायमचे जाऊन रहात व मग अर्थात् तेथेंच त्यांना मृत्युलाभ व मोक्षप्राप्ति होई. पूर्वकाळी अशा यात्रांना पाय किंवा बैलगाडीनें जाऊन येण्यास सहज वर्ष साहा महिने लागत व म्हणून पुरातनकाळीं काशीयात्रेस निघतांना लोक आपल्या मालमत्तेची निरवानिरव करून व मृत्युपत्र करून घर सोडीत असत. पूर्वकाळीं ज्या यात्रा करून येण्यास दहाबारा महिने लागत त्या यात्रा हल्लींच्या जलद प्रवासाच्या साधनांनीं दहा बारा दिवसांत आटपता येतात याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. कारण ही त्रिस्थळी यात्रा, व अयोध्या, मथुरा, वृंदावन, दिल्ली, आग्रा वगैरे प्रेक्षणीय स्थळे मी खरोखरी तीन आठवड्याचे आंत सावकाशपणें पाहून परत स्वस्थानीं आलों. या माझ्या त्रिस्थळी यात्रेचें वर्णन या व पुढील प्रकरणांत करावयाचा विचार आहे.{{nop}}<noinclude></noinclude> qk5uzs6xm2nfafltxglbes2oabe4av2 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४२ 104 110928 233052 2026-07-10T15:49:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233052 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११० |काशी - रामेश्वर यात्रा.|}}</noinclude>खालच्या दगडावर टेकलेला आहे. तो इतके दिवस वारा पाऊस यांच्या वेगांना तोंड देऊन त्या निमुळत्या बैठकीवर कसा राहिला व तो घसरून खाली पडला कसा नाहीं याचें राहून राहून आश्चर्य वाटलें. आणखी बरेंच वर गेल्यावर आणखी एक चमत्कार मीं पाहिला. ही एक निसर्गकृत गुहा होती. ही साधारण चौकोनी असून सहासात फूट उंच होती. त्यांत पांचचार माणसें सहज बसतील इतकी ती मोठी होती. त्या गुहेच्या एक एका बाजूला मोठा थोरला प्रचंड दगड होता. त्या चार दगडांवर दोन आडवे प्रचंड दगड तुळयासारखे व पाटणी वजा बसविलेले होते! चार दगडांमध्ये लहान लहान खिडक्या- सारख्या भेगा किंवा खुल्या जागा होत्या! अशी ही विलक्षण व आश्चर्यकारक निसर्गकृत गुहा पाहून आम्ही आश्चर्यानें थक्क झालों. या टेकड्यांची ओळ बरीच लांब आहे. म्हणून आम्हांला मदनमहालास पोहोंचण्यास फार वेळ लागला. हा मदनमहाल अगदी टेंकडीच्या माथ्यावर आल्याखेरीज दिसत नाहीं. कारण टेंकडीवर थोडासा पठार आहे. हा मदनमहाल पठाराच्या पलीकडच्या टोकाला आहे. या मदनमहालाची रचना व बांधणी विलक्षण आहे खरी. हा मदन- महाल म्हणजे एक चार पांच मजली मनोऱ्यासारखा आहे. प्रत्येक मजल्याला दोन तीन खणी खोलीयेवढी इमारत असून पुढें लहानसा खुला व्हरांडा आहे. वर जाण्यास दगडी जिना आहे. पण या मदन- महालाची मौज ही आहे कीं, हा येवढा उंच मनोरा दोन प्रचंड शिलावर बांधलेला आहे. या पायावजा दोन शिलांमध्ये एक अत्यंत चिंचोळी भेग आहे. या भेगेमधून भुयार असून ते गऱ्हा शहरांतील गोंड राजाच्या राजवाड्यापर्यंत पोखरलेलें असून तो एक गुप्त मार्ग होता अशी समजूत आहे. हें मदनमहालाचें दुर्गम ठिकाण दक्षिणेतील डोंगरी किल्ल्यांतील बालेकिल्ल्याप्रमाणे थेट दिसले. या टेंकडीच्या रांगेमध्य हे सर्वांत उंच ठिकाण आहे; याचे खालीं व टेंकडीचे पठारावर पुष्कळ वाडे व इमारती असून सभोंवार तटबंदी केलेली असावी असें मोडक्या तोडक्या भीतींच्या<noinclude></noinclude> hbky397snf5dx5zsq2tc7na2fesxbhp पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४६ 104 110929 233056 2026-07-10T16:04:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233056 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११|काशी - रामेश्वर यात्रा.|}}</noinclude>असे मला वाटलें. महादेवाचें देऊळ फार छोटे आहे. कारण हा खडक फार मोठा नसल्यामुळे खोदावयास जागा थोडी मिळाली. महादेवाचें दर्शन घेतल्यावर आम्ही देवळाच्या बाजूच्या दगडी जिन्यानें देवळाचे वरच्या खडकावर गेलों. तेव्हां तो खडक फारसा लांब रुंद दिसला नाहीं. पलीकडे तांबड्या मातीची टेकडी लागली. त्या वाटेनें जरासे वर चढून आम्ही हत्तीच्या सोंडेसारख्या खडकावर आलों. सभोवारच्या मदन महालाप्रमाणे येथूनही जबलपूर शहाराचा व भूमिभागाचा मोठा मनोहर देखावा दिसला. हे ठिकाण वनोपाहारास फार नामी आहे असे मला वाटलें व येथें सुटीच्या दिवशीं पुष्कळ लोक वनोपाहारास येतात असे मला माझ्याबरोबर आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितलें. याप्रमाणें जबलपूर शहाराच्या आसपासची पुरातन काळची दोन प्रेक्षणीय स्थळे पाहून बाराचे सुमारास आम्ही बिऱ्हाडीं परत आलों. माझ्या मित्राच्या दोन विद्यार्थ्यांनी मजबरोबर येऊन मला माझ्या दृश्यदर्शनास मदत केली म्हणून मी त्यांचे आभार मानले व मग ते आपल्या घरोघर गेले.<Br>{{gap}}माझें जबलपुरचें दृश्यदर्शन व माझा तेथला निवास संपत आला. महाराष्ट्र प्रांतांतील '''अहमदनगर''' शहराच्या प्रमाणें जबलपुर हे मध्यप्रांतांतील एक लष्करी ठाणें असल्यामुळें येथें इंडियन व युरोपीयन अशा दुहेरी पलटणींची छोटीशी छावणी आहे. नगरला गेलें म्हणजे ज्याप्रमाणे नगरच्या किल्ल्याची बाजू व एकंदर लष्करहद्दींतील रस्ते प्रशस्त, गर्दछाय, व निर्धूळ दिसतात व शहाराच्या आसपास खुलीं मैदानें व कवाईतीच्या जागा दिसतात त्याप्रमाणेंच जबलपुरची स्थिति आहे. येथल्या लष्करची छावणी नगरच्या छावणीप्रमाणें एका टेकडीवजा उंच पठारावर आहे. त्या पठाराकडे जाणारा रस्ता फारच सुंदर आहे. तो निर्धूळ, डामरी, सरळ सुतासारखा रस्ता, तीं दुतर्फा हारीनें लावलेली कडूनिंबाचीं व इतर विलायती झाडांची रांगचरांग, तीं तांबूसरंगी मातीचीं, सपाट व एैसपैस खुलीं मैदानें व<noinclude></noinclude> is4q2l89svtjutlgcmx7z5qb07rdhtc पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४७ 104 110930 233057 2026-07-10T16:06:59Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233057 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|११५ }}</noinclude>क्षितिजावर पसरलेली ती निळसर हिरवट रंगाची छावणीची लांबचलांच टेकडी हा देखावा मोठा नयनमनोहर दिसतो. आम्ही एका सायंकाळीं या सुंदर सडकेनें छावणीच्या टेकडीवर मोटारीनें गेलों. ती नागमोडी तांबड्या खडीची घाटवजा सडक फार नामी दिसली. टेकडीच्या पायथ्याशीं टांग्याचा मोठा अड्डा दिसला. टेकडीवर मधून मधून नानारंगी फुलवृक्ष लावलेले आहेत. टेकडीच्या माथ्यावर मोठा थोरला पठार असून तेथें इंडियन व युरोपीयन शिपायांच्या बराकीच बराकी आहेत. इंडियन शिपायांच्या बराकी कमी प्रतीच्या व झोपडीवजा तर युरोपीयन शिपायांच्या बराकी उंच प्रतीच्या व बंगलेवजा असा विरोध तेथे दृष्टीस पडला. अंमलदाराकरितां मधून मधून स्वतंत्र बंगलेही बांधलेले दिसले. येथूनही जबलपूर शहर व आसपासचा प्रदेश दूरवर दिसला व जबलपूर हे शहर कसें पर्वतवलयांकित असून सपाटीवर वसलेले आहे हे दिसून आलें व या शहरांत पाण्याची विपुलता कां हेंही समजून आलें. सभोवारच्या टेकड्यावरचा सर्व पाणलोट शहराच्या आसपासच्या भूमिभागाकडे असल्यामुळे पावसाचें सर्व पाणी जमिनींत मुरलें जातें. यामुळे येथें पाणी विपुल आहे व जमीन सुपीक असल्यामुळे या सर्व भागांत झाडीही पुष्कळ आहे. पूर्वकाळच्या राजवटीमध्यें येथें आंब्याची लागवड फार मोठ्या प्रमाणावर करीत असत असें जागजागीं असलेल्या आंबारायांवरून कळून आलें. सर्व शहराचा व त्याच्या आसपासच्या भूमिभागाचा सुंदर देखावा पहात आम्ही काळोख पडेपर्यंत त्या पठारावर उभे होतों व मग मोटारीतून भरदिशीं बिऱ्हाडीं आलों.<Br>{{gap}}मी ज्या रात्रीं जबलपुराहून प्रयागास जाण्याचा बेत केला होता, त्या दिवशींच्या सायंकाळी माझ्या प्रोफेसर मित्रांनीं आपल्या पांचपंचवीस स्नेही मंडळीस फराळास बोलाविलें होतें. यामुळे जबलपुरांतील बऱ्याच सुशिक्षित मंडळीशी माझा परिचय झाला व निरनिराळ्या विषयावरील संभाषणाचा मला लाभ झाला.{{nop}}<noinclude></noinclude> r07d45fsp0ckm4a80ir427zr235jqo5 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४८ 104 110931 233058 2026-07-10T16:08:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233058 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११|काशी - रामेश्वर यात्रा.|}}</noinclude>{{gap}}मध्यप्रांतामध्यें जबलपूर हे शहर प्रांताच्या राजधानीच्या तोडीचें आहे असें तेथें जाणाऱ्या प्रवाशास वाटल्याखेरीज रहात नाहीं. शिवाय या शहराचे हवापाणी उत्तम असून या शहराची वाढ होण्यास अतोनात वाव आहे. युरोपीयन लोकांचें हे एक आवडतें ठिकाण आहे. कलकत्त्याहून हिंदुस्थानची राजधानी हलवून दुसरीकडे नेण्याचें घाटत असतांना दिल्ली खेरीज ज्या दोन चार शहरांचीं नांवें सुचविण्यांत आलीं होतीं त्यामध्यें जबलपुरचें नांव होतें असें मीं ऐकलेलें आहे. जबलपुर शहर पाहिल्यावर सर्व हिंदुस्थानची राजधानी बनण्याची शक्यता या शहराचे अंगीं आहे असें वाटल्याखेरीज रहात नाहीं हें खास.<br><br><br> {{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 5kgmm1grvldm01npzqyh9pxfvqtcwr3 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५० 104 110932 233060 2026-07-10T16:16:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233060 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११८ |काशी - रामेश्वर यात्रा.|}}</noinclude>{{gap}}प्रयाग, काशी व गया हीं पुरातन काळापासून प्रख्यात असलेल यात्रास्थळे ज्याप्रमाणें हिंदुधर्मी लोक फार पवित्र मानतात त्याप्रमाणें बुद्धधर्मी लोकांना हीं स्थळें फार पवित्र वाटतात. कारण बौद्धधर्माचा उत्पादक जो गौतमबुद्ध त्याच्या आगमनानें व निवासानें हीं स्थानें पावन झालीं आहेत. इतकेंच नव्हे तर गौतमबुद्धाच्या आयुष्यांतील महत्त्वाचे प्रसंग येथें घडून आले असून बौद्धधर्माचा उदय व प्रवर्तन या स्थळी झालेलें आहे. म्हणून पूर्वकाळापासून अर्वाचीन काळापर्यंत जेथे जेथें बौद्धधर्म प्रचलित आहे तेथून तेथून बौद्धधर्मी लोक या पवित्र स्थळीं येऊन गेलेले आहेत. चीन देशांतून पूर्वकाळीं येऊन गेलेल्या चिनी प्रवाशांची हिंदुस्थानासंबंधींच्या माहितीनें भरलेलीं प्रवासवर्णनें हींच काय तीं हिंदुस्थानच्या पुरातनकाळच्या विश्वसनीय इतिहासाचीं व भूगोलाचीं साधनें बनलीं आहेत. ही किती आश्चर्याची व नवलाची गोष्ट आहे. अशी दोन्ही धर्मांना पवित्र वाटणारी व पुरातन काळापासून प्रख्यात असलेलीं स्थळे पहाण्यास जातांना वरच्या सारखे विचार माझ्या मनांत सारखे घोळत होते.<br>{{gap}}जबलपुराहून प्रयागास जाण्यास मी ता. २६ मार्च सन १९३५ रोजी रात्रीं अलाहाबादवरून पुढे जाणाऱ्या गाडीनें निघालों. या गाडीनें चौकी जंक्शनवर गाडी न बदलतां एकदम प्रयागला जाता येते. त्याप्रमाणें चौकी जंक्शनशीं गाडी सव्वापांच वाजतां आली. या प्रांतांत या दिवसांत लवकर उजाडत असल्यामुळे चौकीच्या आधीपासूनच चांगलें दिसू लागलें होतें. येथपासून स्टेशनवर प्रयागचे पंडे यात्रेकरूबद्दल गाडींत व स्टेशनवर चवकशी करूं लागले. थोड्यावेळानें नैनी जंक्शन स्टेशन आलें. अलीकडच्या असहकारितेच्या चळवळीपासून नैनी हें नांव वर्तमानपत्रांत पुष्कळदां आलेलें आहे. कारण येथें संयुक्तप्रांतांचा मोठा तुरुंग असून पुण्यानजीकच्या येरवडा तुरुंगाप्रमाणे कित्येक प्रख्यात पुढारी या तुरुंगांत सरकारनें डांबून टाकल्यामुळे या जागेचें व तुरुंगाचें नांव हिंदुस्थानांत सर्वतोमुखी झालें आहे हें ध्यानांत येऊन मला 'येन<noinclude></noinclude> cx7d1w4edfpoun7kgajgvtqt5zd1k48 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५१ 104 110933 233061 2026-07-10T16:18:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233061 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जबलपूर|११९ }}</noinclude>केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषोभवेत्' या म्हणीची आठवण झाली व पुरुषाप्रमाणे “येन केन प्रकारेण प्रसिद्धं नगरं भवेत्" अशी जोड म्हण व्हावयास पाहिजे असे मला वाटलें. या नैनी जंक्शनला पुष्कळ यात्रेकरू उतरतात असे दिसलें. येथें स्टेशनवर पंड्यांचीही थोडी गर्दी दिसली. नैनी हें गांव यमुनेच्या दक्षिण तीराला असून स्टेशन टांकल्याबरोबर यमुना नदीचा मोठा भव्य व लांबच लांब पूल लागला. आगगाडी पुलावरून जातांना मोठी मौज वाटते. कारण इकडले मोठमोठ्या नद्यांवरील पूल दुमजली असून खालून बैलगाडी व वरून आगगाडी जाण्याची व्यवस्था केलेली आहे. कोठें कोठें एक मजली पूल असून त्यांवरून रेलवेफाटकासारखे फाटक करून एकदम बैलगाडी व आगगाडी जाण्याची सोय केलेली आहे. पण यामुळे प्रथम प्रवाशाला या सोयीचें व योजनेचें मोठें नवल वाटतें यमुनानदीचा पूल टाकल्याबरोबर प्रयाग शहरच लागलें व त्या शहरांतील पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र घरांचें व सार्वजनिक इमारतींचे दाट रानच रान पाहून मला आश्चर्य व पूर्वपरिचयाचा आनंद वाटला. कारण एकोणतीस वर्षापूर्वी घाई- घाईनेंच कां होईना पण कलकत्त्यास १९०६ च्या काँग्रेसला जातांना मी प्रयाग पाहिलें होतें. त्यावेळीं फर्ग्युसन कॉलेजांतील प्रो. हरिभाऊ लिमये माझ्याबरोबर होते. त्या माझ्या मित्राचें व त्यांच्या बरोबर केलेल्या सर्व प्रवासाचें मला स्मरण झालें व यामुळें खेद व आनंद असा मिश्र मनोविकार माझ्या मनांत उद्भूत झाला. मी आगगाडीच्या डब्यांतून खाली उतरलों तोंच प्रो. रानडे (ज्यांना मी माझ्या येण्याबद्दल पत्र लिहिलें होतें) यांचा मनुष्य मला भेटला.<br>{{gap}}सामान हमालाचे डोकीवर देऊन त्या माणसांबरोबर मी मोटार रस्त्याशीं आलों. मात्र हा रस्ता गांठण्यास मला दोन वेळां जिन्याची चढउतार करावी लागली. प्रयागला हल्लीं कितीतरी निरानराळ्या कंपन्यांचे रेलवे रस्ते येऊन मिळाले असून येथें रेलवेरस्त्यांचें मोठें गुंतागुंतीचें एक जाळेंच बनले आहे हें पाहून मला फार आश्चर्य वाटलें.<noinclude></noinclude> lz58c63ucwcmff2pazot42qpwtrdn0p पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५२ 104 110934 233062 2026-07-10T16:19:42Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ १२० काशी - रामेश्वर यात्रा मोटाररस्त्याशी आल्यावर मी प्रो. रानडे यांचे मोटारींत बसून त्यांच्या बंगल्यावर गेलो.<br>{{gap}} प्रयाग किंवा अलाहाबाद हैं हिंदुस्थानांतील एक फार पुर..." 233062 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ १२० काशी - रामेश्वर यात्रा मोटाररस्त्याशी आल्यावर मी प्रो. रानडे यांचे मोटारींत बसून त्यांच्या बंगल्यावर गेलो.<br>{{gap}} प्रयाग किंवा अलाहाबाद हैं हिंदुस्थानांतील एक फार पुरातन व प्रख्यात पवित्र यात्रास्थान ( त्याला तीर्थराज म्हणतात ) असून सध्यां तें संयुक्तप्रांताचे कायदेशीर व औपचारिक राजधानीचे शहर आहे ( कारण अलीकडे लखनौ हें प्रत्यक्ष व वस्तुतः राजधानीचे शहर बनविण्यांत आलेलं आहे. ) तेव्हां या शहराची पूर्वपीठिका व धार्मिक माहात्म्य व पावित्र्य यांचें वर्णन मागाहून करावें. प्रथमतः त्याची सद्य:- स्थिति व अर्वाचीन काळची प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती यावी असा मीं बेत केला आहे.<br>{{gap}} प्रयाग हैं शहर गंगा व यमुना या नद्यांच्या संगमावर पण नद्यांच्या दुबेळक्यांत वसलेले आहे. या शहराचा विस्तार अफाट असून हैं सर्व शहर अत्यंत सपाट, सुपीक, पांढुरक्या भूमिभागावर वसलेलें आहे. या शहराला गंगा यमुना या नद्यांनी स्वाभाविक मर्यादा घातल्या आहेत. कारण या शहराची दक्षिण मर्यादा यमुनानदीनें बनली असून ती नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वहात गेली आहे; तर गंगानदी या शहराची उत्तर व पूर्व मर्यादा बनली आहे. कारण गंगानदी यमुनेप्रमाणें पश्चिमेकडून वहात येऊन प्रयागच्या अलीकडे उत्तरवाहिनी होऊन मग मोठे विलक्षण वांकण करून दक्षिणवाहिनी होऊन प्रयाग शहराच्या आग्नेय टोकांस यमुनेस येऊन मिळाली आहे. गंगेच्या या विलक्षण वाकणानें व आग्नेय टोकाच्या संगमामुळें प्रयागच्या उत्तर, पूर्व, दक्षिण या तीन्ही बाजू नद्यांनी मर्यादित झाल्या आहेत; फक्त शहराची पश्चिमेकडील बाजू तेवढी मोकळी व शहरवाढीस खुली आहे. अलाहाबाद शहराच्या नकाशाकडे पाहिलें म्हणजे शहराच्या वस्तीचें विस्ताराचे व त्याच्या तटबंदीचें नव्हे निसर्गकृत नदीतटाकांचें मोठें नवल वाटतें. कानपुरा- कडून येणान्या ईस्ट इंडिया रेल्वेचा व बंगाल नार्थ वेस्टर्न रेल्वेचा ,<noinclude></noinclude> bxvjh4axsy734fd07kawzyejjdov8qq 233064 233062 2026-07-11T11:34:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233064 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>मोटाररस्त्याशी आल्यावर मी प्रो. रानडे यांचे मोटारींत बसून त्यांच्या बंगल्यावर गेलो.<br>{{gap}}प्रयाग किंवा अलाहाबाद हे हिंदुस्थानांतील एक फार पुरातन व प्रख्यात पवित्र यात्रास्थान (त्याला तीर्थराज म्हणतात) असून सध्यां तें संयुक्तप्रांताचे कायदेशीर व औपचारिक राजधानीचे शहर आहे (कारण अलीकडे लखनौ हें प्रत्यक्ष व वस्तुतः राजधानीचे शहर बनविण्यांत आलेलं आहे.) तेव्हां या शहराची पूर्वपीठिका व धार्मिक माहात्म्य व पावित्र्य यांचें वर्णन मागाहून करावें. प्रथमतः त्याची सद्यःस्थिति व अर्वाचीन काळची प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती द्यावी असा मीं बेत केला आहे.<br>{{gap}}प्रयाग हे शहर गंगा व यमुना या नद्यांच्या संगमावर पण नद्यांच्या दुबेळक्यांत वसलेले आहे. या शहराचा विस्तार अफाट असून हे सर्व शहर अत्यंत सपाट, सुपीक, पांढुरक्या भूमिभागावर वसलेलें आहे. या शहराला गंगा यमुना या नद्यांनी स्वाभाविक मर्यादा घातल्या आहेत. कारण या शहराची दक्षिण मर्यादा यमुनानदीनें बनली असून ती नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वहात गेली आहे; तर गंगानदी या शहराची उत्तर व पूर्व मर्यादा बनली आहे. कारण गंगानदी यमुनेप्रमाणें पश्चिमेकडून वहात येऊन प्रयागच्या अलीकडे उत्तरवाहिनी होऊन मग मोठे विलक्षण वांकण करून दक्षिणवाहिनी होऊन प्रयाग शहराच्या आग्नेय टोकांस यमुनेस येऊन मिळाली आहे. गंगेच्या या विलक्षण वाकणानें व आग्नेय टोकाच्या संगमामुळें प्रयागच्या उत्तर, पूर्व, दक्षिण या तीन्ही बाजू नद्यांनी मर्यादित झाल्या आहेत; फक्त शहराची पश्चिमेकडील बाजू तेवढी मोकळी व शहरवाढीस खुली आहे. अलाहाबाद शहराच्या नकाशाकडे पाहिलें म्हणजे शहराच्या वस्तीचें विस्ताराचे व त्याच्या तटबंदीचें नव्हे निसर्गकृत नदीतटाकांचें मोठें नवल वाटतें. कानपुराकडून येणाऱ्या ईस्ट इंडिया रेल्वेचा व बंगाल नार्थ वेस्टर्न रेल्वेचा<noinclude></noinclude> isb1i7e1uvoto3b83sjo11rmfx4jpn8 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५३ 104 110935 233065 2026-07-11T11:38:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233065 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१२१ }}</noinclude>रस्ता अलाहाबाद शहराच्या मधून गेला आहे. अलाहाबाद शहराचा जुना व मुख्य भाग हा जोड रेलवेरस्ता व यमुनानदी यांचेमध्यें वसलेला आहे. या जुन्या शहराचे जबलपुराकडून येणाऱ्या दक्षिणोत्तर रस्त्याने आणखी दोन विभाग पडले आहेत. एक यमुना पुलापासून संगमापर्यंतचा पूर्वभाग व दुसरा यमुना पुलापासून कानपूरकडून येणाऱ्या रेलवे लाईनवरील सुभेदारगंज रेलवे स्टेशनपर्यंतचा पश्चिमभाग. या रेल्वे रस्त्याच्या उत्तरेस अलाहाबाद शहराची नवी नीटनेटकी, सुबक व सुंदर वस्ती आहे व त्याचे स्वाभाविक तीन विभाग पडतात. पश्चिमेकडच्या अंगास नवें कँटोनमेंट आहे. अलाहाबाद स्टेशनचे समोर व मध्य अंगास सिव्हिल स्टेशन आहे. तर पूर्व अंगास आल्फ्रेड पार्क; गव्हर्नमेंट हाऊस व जॉर्जटाऊन आहे. याचे तिसऱ्या विभागाचे उत्तरेस कट्रा नांवाचा विभाग असून तेथें अलाहाबाद विश्वविद्यालयीन इमारती, बंगले व दुकानें आहेत. त्याचेही उत्तरेस जुने कँटोनमेंट व रेसकोर्स आहे. याचे उत्तरेस गंगेचं मोठें वाकण आलें आहे. तेथें गंगेवर ई. आय. आर. रेल्वे कंपनीचा कर्झन नांवाचा मोठा जोडपूल आहे. त्यावरून '''फैजाबाद''' अयोध्येकडे जाणारा मोटाररस्ता व आगगाडीचा रस्ता गेला आहे. बंगाल नॉर्थ वेस्टर्न रेल्वेनें संगमाचे नजीक पण गंगेच्या पूर्ववाहिनी प्रवाहावर एक जोडपूल बांधला आहे. त्या पुलाचे उत्तरेस व गंगाप्रवाहाच्या पश्चिमेस '''दारागंज''' म्हणून प्रख्यात असलेली अलाहाबादची नवी वस्ती आहे. शहराच्या या भागाकरितां ई. आय. आर. रेल्वेनें एक रेल्वेचा फाटा आणला असून त्याचें दारागंज नांवाचें स्टेशन आहे; तसेंच त्या कंपनीनें आणखी एक रेल्वेचा फाटा अलाहाबाद किल्ल्याचे नजीक आणला असून तेथेही फोर्ट स्टेशन केलें आहे. दारागंज स्टेशन व फोर्ट स्टेशन हीं दोन्हीं शहरांतील स्टेशनें संगमानजीक आहेत व म्हणून तीं प्रयागला येणाऱ्या लाखो यात्रेकरूंच्या उपयोगाकरितां केलेली आहेत असें दिसतें.{{nop}}<noinclude></noinclude> ktyitqndlnbvi2crygvt2yrnqm87jlo पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५४ 104 110936 233066 2026-07-11T11:44:35Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233066 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}अलाहाबाद शहराच्या वर वर्णिलेल्या विभागावरून अलाहाबाद हे फार अफाट शहर आहे असे दिसून आल्यावांचून राहणार नाहीं. हे शहर साधारणतः चौकोनी असून त्यांची पूर्वपश्चिम व दक्षिणोत्तर लांबी सुमारें साहासात मैल आहे; म्हणजे या शहराचे क्षेत्रफळ पसतीस छतीस चौरस मैल भरेल. या विस्तीर्ण व अफाट शहराचे रस्तेही राजधानीला शोभेसे प्रशस्त व सरळ आहेत.<br>{{gap}}ग्रँट ट्रंक रोड नांवाचा मोठा प्रशस्त सुंदर रस्ता शहराच्या पश्चिम टोकापासून पूर्वेकडील गंगेच्या पुलापर्यंत जुन्या शहराच्या थेट मधून गला आहे. हाच रस्ता दिल्ली-कानपूरकडून काशी-कलकत्त्याकडे गेला आहे; तसेंच दुसरा असा एक मोठा रस्ता कानपूररोड नांवाचा उत्तरेस गंगेच्या कर्झनपुलावरून फैजाबाद-अयोध्येकडे गेला आहे. जुन्या शहरांत रस्त्याचें काय नुसतें जाळें झालेलें आहे. पण रेलवेरस्त्याच्या उत्तरेकडील नव्या वस्तीमध्यें मात्र बुद्धिबळाच्या पटासारखे पूर्वपश्चिम व दक्षिणोत्तर असे सुंदर डामरी, निर्धूळ व गर्दछाय वृक्षांनी मंडित रस्ते केलेले आहेत. आधीं मुख्य स्टेशन समोरच एक क्वीन्सरोड नांवाचा वर्तुळाकार चौकानें मंडित असा फारच प्रशस्त व भव्य रस्ता केला आहे. या वर्तुळाकार चौकांतच ख्रिस्ती प्रार्थनामंदिराची सुंदर इमारत आहे. या वर्तुळाकार चौकाचे चारी बाजूस पोस्ट ऑफिस, टेलिग्राफ ऑफिस, म्युनिसिपल ऑफिस, अलाहाबाद बँक ऑफिस अशा सरकारी व अर्ध सरकारी इमारती असून शिवाय इतर दुकानें व हॉटेलें आहेत. या वर्तुळाकार चौकामधून पूर्वपश्चिम '''कॅनिंग रोड''' नांवाचा मोठा प्रशस्त रस्ता गेला आहे. त्याचे पश्चिम टोकास हायकोर्टाची भव्य इमारत आहे. हा रस्ता गव्हर्नमेंट हाऊसच्या दक्षिण बाजूच्या भिंतीला लागून थेट किल्ल्यासमोरील रस्त्याला येऊन मिळाला आहे. क्वीन्सरोडनें बरेंच उत्तरेस गेलें म्हणजे प्रथम सरकारी छापखान्याच्या इमारती व मग युनायटेड प्रॉव्हीन्सेस सरकारच्या सेक्रेटरिएटच्या विस्तीर्ण इमारती लागतात. या इमारतीचे पलीकडून कॅनिंगरोडला समांतर व तितकाच प्रशस्त व सुंदर थॉर्नहील<noinclude></noinclude> tusw07l15gbt6irb4e1d5eejersb01n पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५५ 104 110937 233067 2026-07-11T11:47:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233067 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१२३ }}</noinclude>रोड नांवाचा रस्ता पश्चिमेकडून पूर्वेकडे जाऊन फोर्ट रस्त्याला येऊन मिळतो. या वस्तीतील झाडून साऱ्या रस्त्यांना युरोपीयनांचीं नांवें आहेत. प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा कितीतरी युरोपीयनांचीं नांवें प्रवाशाच्या दृष्टीसमोरून जातात; उ. एलजीन रोड, एडमॉनस्टन रोड, हेस्टींग्स रोड, मॅन्ड रोड, औटरॅम रोड, लॉरेन्स रोड, हॅव्हलॉक रोड, मूर रोड, हॅरीस रोड, ऑकलंड रोड. पुरातन काळापासून पवित्र मानलेल्या व प्रख्यात असलेल्या प्रयागक्षेत्री इतकीं परकीयांची व परधर्मीयांची नावें पाहिल्यानें प्रवाशाला सखेदाश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाहीं हें खास. या सर्व भागाचे ओझरतें दर्शन घेतांना मला असाच अनुभव आला मला सांगितलें पाहिजे.<br>{{gap}}ज्याप्रमाणें अलाहाबाद शहरीं अर्वाचीनकाळी प्रशस्त व विपुल रस्ते झाले आहेत त्याप्रमाणेच या शहरांत व शहराच्या आसपास अतोनात झाडी आहे. या शहराच्या आसपास फारशी बागाईत किंवा म्हणण्यासारख्या बागा दिसल्या नाहींत. पण निरनिराळ्या वृक्षांच्या रांगा खूप दिसतात; तसेच जिकडे तिकडे हरळीनें आच्छादित अशा खुल्या जागा व मैदानेही पुष्कळ आहेत. या उन्हाळ्याच्या दिवसांत हीं मैदानें व या जागा तितक्या नयनमनोहर दिसत नाहींत. पण पावसाळ्यांत व हिवाळ्यांत त्या हरळीच्या वाढीनें हिरव्या हिरव्यागार असतात व त्यावेळचा या शहराचा देखावा जास्त नयनमनोहर दिसतो. अलाहाबाद शहराचें इतकें सामान्य स्वरूपनिरूपण पुरें आहे. आतां प्रेक्षणीय स्थळवर्णनास लागणें बरें.<br>{{gap}}अलाहाबाद शहराचें माझें दृश्यदर्शन हिंदुस्थानला येणाऱ्या युरोपीयन अगर इंग्रज प्रवाशांच्याप्रमाणें झालें. कारण माझे मित्र प्रो. रानडे हे नाजुक प्रकृतीचे गृहस्थ असल्यामुळे त्यांना चालण्याची मुळींच संवय नाहीं. मागें उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या पायदुखीमुळे मलाही फारसें<noinclude></noinclude> 4y0qgoskaw3ydolzudfflu0bta4swxy पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५६ 104 110938 233068 2026-07-11T11:56:40Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233068 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>चालावयाचें नव्हतें. तेव्हां आम्हीं अलाहाबादचें सर्व दृश्यदर्शन मोटारीमधून जाऊन केलें. यामुळे सिनेमांतील चित्रपटाप्रमाणे आम्हीं शहरांतील प्रेक्षणीय स्थळे भराभर व फार जलद पाहिलीं. पाय पायीं चाललें म्हणजे प्रेक्षणीय स्थळे सावकाश व स्वस्थपणें पहावयास सांपडतात. तशी संधी मला या ठिकाणी मिळालीच नाहीं. पण अलाहाबादेस पांच सहा दिवस मी असतांना बहुधां रोज सकाळ संध्याकाळ शहरांतील निरनिराळे विभाग आम्ही पहात असूं. त्याचें यथाक्रम वर्णन करतों.<br>{{gap}}एके दिवशीं सकाळीं मीं कट्रा भागांतील अलाहाबाद विश्वविद्यालयाच्या निरनिराळ्या विद्याशाखांच्या इमारती पाहिल्या. येथें प्रत्येक विषयाला एक युनिव्हर्सिटी प्रोफेसर, एक रीडर व एक दोन लेक्चरर अशी व्यवस्था असून प्रत्येक शिक्षकाला स्वतंत्र खोली व तेथेंच त्यांचे विद्यार्थी बसण्याची सोय केलेली आहे; प्रत्येक विषय शिकविण्याकरितां एक मोठा वर्ग असून प्रत्येक विषयाचें छोटे वाचनालय आहे. हे विश्वविद्यालय हल्ली यूनिटरी असल्यामुळे येथे आतां एकच युनिव्हर्सिटी कॉलेज आहे. शहरांतील बाकीचीं कॉलेजें हीं इंटरमिडिएट दर्जाचीं असून त्या इंटरमिडिएट परीक्षेची व्यवस्था सुद्धां निराळ्या बोर्डाकडे आहे. यामुळे बी. ए., बी. एससी. व एम. ए., एम. एससी. व इतर धंद्याच्या पदव्यांचें शिक्षण सर्व एकत्र पण निरनिराळ्या इमारतींत चालतें. विश्वविद्यालयाचें मोठें ग्रंथसंग्रहालय असून त्याची इमारत सुंदर व प्रशस्त आहे. अलाहाबाद येथे असलेलें मोठें म्यूर कॉलेज व त्याची मोठ्या थोरल्या मनोऱ्यानें मंडित प्रचंड इमारत हिचा हल्लीं विश्वविद्यालयाच्या भौतिक शास्त्राकरितां व त्यांच्या प्रयोग शाळाकरितां उपयोग केला जातो. या जुन्या कॉलेजच्या इमारतीशेजारीच भव्य तीन सोप्याची व दुमजला एक इमारत आहे. हें विश्वविद्यालयांतील विद्यार्थ्यांचें वसतिगृह असून त्याला मॅकडोनल्ड हॉस्टेल म्हणतात. या युनिटरी युनिव्हर्सिटी होण्यापूर्वीच्या दोन्ही इमारती वाखाणण्यासारख्या आहेत.{{nop}}<noinclude></noinclude> oazx18vok16o5q44e5hlolzzuc82zhr