विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.10
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf
106
1874
233096
232978
2026-07-12T07:10:30Z
कल्पनाशक्ती
3813
233096
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]]
|Language=mr
|Volume=
|Author=विवेकानंद
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=न. म. कुलकर्णी
|Address=
|Year=१९२२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति" 169 ="हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप" 201="हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
0pi5cgzy5b1r99lytpnywnf9srhr0l4
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८६
104
66751
233074
151548
2026-07-11T12:37:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233074
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८१ }}
{{rule}}</noinclude>म्हणणे आहे. माझ्यासमोर एक पडदा असून त्याला एक लहानसे छिद्र आहे असे समजा. अशा स्थितीत येथील मंडळीपैकी काहींची तोंडे मात्र मला दिसतील आणि बाकीची दिसणार नाहीत हे उघड आहे. आतां हेच छिद्र हळूहळू मोठे होत गेले तर अधिकाअधिक चेहरे मला दिसू लागतील आणि अशा रितीने सर्व पडदा नाहीसा झाला म्हणजे येथील सारे सभासद माझ्या दृष्टिपथांत येतील. अशा रीतीने माझ्या दृष्टीत आणि तुमच्यांत मध्ये कांहींच अडथळा राहिलेला नाही. पूर्वी मी तुम्हांस दिसत नव्हतों आणि तुम्हीही मला दिसत नव्हता; आणि आतां एकमेकांस आपण दिसू लागलो. यांत तुमच्यांत अथवा माझ्यांत काही बदल झाला काय? तुमच्याआमच्यांत बदल झाल्यामुळे आपण एकमेकांस पाहू लागलों असें झाले आहे काय? आरंभी तुमचे रूप जे होतें तेंच आतांही आहे. बदल झाला तो तुमच्यांत झाला नसून मधल्या पडद्यांत झाला. अद्वैतवाद्यांच्या मतांतील मुद्दा अशा प्रकारचा आहे. सृष्टीची उत्क्रांति होते आणि तीबरो बरच आत्मा व्यक्तरूपाला येऊ लागतो. आत्मा आकुंचित असतो आणि मग तो विस्तार पावत जातो हे म्हणणे अद्वैतवाद्यांना मान्य नाही. आत्म्याला आकुंचित करूं शकेल असा काही पदार्थच जगांत नाही. तो सर्वदा एकरूप आहे. त्याच्यांत कधीही बदल होत नाही. तो अनंत आहे. मग त्यांत बदल कसा आणि कशाने होणार? त्याच्यावर सृष्टीचा पडदा आरंभी पडला होता. तो मायेच्या आवरणाखाली गुप्त झाला होता. हे मायेचे आवरण जो जों कमी होत जातें, तो तों आत्म्याचे स्वरूप व्यक्त होऊ लागते. आत्म्याचे मूळचे स्वाभाविक तेज कधी नष्ट झाले नव्हतें अथवा कमीही झाले नव्हतें. मायेचा पडदा त्याजवर आल्यामुळे ते अदृश्य मात्र झाले होते; आणि हा पडदा दूर होऊ लागतांच ते पुन्हां दिसू लागलें. जो जो हा पडदा अधिक विरळ होत जाईल, तों तों तें अधिकाधिक दृश्यमान होऊ लागेल. हेच मत आमच्या हिंदुस्थानापासून साऱ्या जगानें शिकले पाहिजे. आज आपल्या सुधारणेच्या केवढयाही मोठ्या गप्पा त्यांनी मारल्या आणि आज आपल्याच तोऱ्यांत ते कितीही गर्क होऊन राहिले असले, तरी अखेरीस हे मत आप लेसे केल्यावांचून जगांतील कोणत्याही मानवसमाजाचा निभाव लागावयाचा जाहीं असें कबूल करणे त्यांस भाग पडेल. जगांतील सारेंच चक्र फिरूं लागले<noinclude></noinclude>
nqvfbk4sqfuwz34oukumb20t2ms7qyn
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८७
104
66752
233075
151957
2026-07-11T12:42:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233075
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>आहे, हे तुम्हांस आजसुद्धा दिसून येईल. पूर्वीची सारी मतें हळूहळू विराम पावू लागली आहेत. प्रत्येक वस्तु स्वभावतःच दुष्ट आहे असा समज प्राचीनकाळी होता. शिक्षणपद्धतींत, न्यायपद्धतींत आणि वैद्यकांतसुद्धा हेच मत पूर्वी प्रचलित होते. मनुष्याचे मन स्वभावतःच दुष्ट व अनीतीकडे धावणारें असून त्याला सुवृत्त करण्याकरितां शिक्षण द्यावयाचे असें पूर्वी मानीत. त्याचप्रमाणे एखाद्या गुन्ह्याचा आरोप एखाद्यावर आला, तर आपला निरपराधीपणा त्याला शाबीत करावा लागे. तो अपराधी आहेच असे गृहीत धरून चालण्याची प्रवृत्ति पूर्वी होती. शरीर हे मूळचेच छप्पन रोगांचे माहेरघर असून औषधे देऊन सुदृढ करावयाचे असा वैद्यांचा समज होता. पण आतां हे सारे समज उलटे झाले आहेत हे आपण पाहत नाही काय? आतांचा कायदा म्हणतो की शरीर हे स्वभावतःच सुदृढ असून त्याला झालेले रोग त्याचें तेंच बरे करीत असते. औषधांचे काम फक्त या क्रियेला मदत करण्याचे आहे. हेच फौजदारी कायद्याचें आदितत्त्व आहे. प्रत्येक आरोपी सुवृत्त असून गुन्हा शाबीत होईपर्यंत त्याला गुन्हेगार मानूं नये असें अर्वाचीन कायदा सांगतो. तुरुंगांतील कैद्यांना वागविण्याच्या पद्धतीतही असाच बदल आता होऊ पहात आहे. मनुष्य कितीही अधोगतीला गेला असला, तरी त्याच्या ठिकाणीही ईश्वरांश आहे तो ओळखला पाहिजे, हे मत कैद्यांच्या बाबींतसुद्धा प्रचलित होत आहे. जुनी मते एकामागे एक कशी नाहीशी होत चालली आहेत हे यांवरून दिसेल. अत्यंत भयंकर गुन्हेगारांचीही नीतिमत्ता सुधारावी आणि त्यांनी चांगले व्हावे याकरिता त्यांना शिक्षण देणारे आश्रमसुद्धा स्थापन होऊ लागले आहेत. हा सारा बदल कशाने झाला? सर्वांच्या अंतर्यामी परमेश्वराचा वास आहे, या आमच्या आर्यमताचा हा विजय आहे. पाश्चात्य देश समजून अथवा न समजता या मताचे ग्रहण करीत आहेत. या बाबींत पाश्चात्यांनी आमचेच शिष्यत्व पत्करले पाहिजे. या साऱ्या वस्तूंच्या कार्यकारणभावाचा उलगडा आमच्या ग्रंथांत त्यांस सांपडेल. मनुष्यांतील परस्परांचे संबंध आजवर जसे चालत आले आहेत तसे यापुढे चालणार नाहीत. या संबंधांत आतां पूर्ण क्रांति व्हावयाची आहे. आतां साऱ्या जुन्या मतांनी राम म्हणण्याची वेळ आली आहे. चालू (एकोणिसाव्या) शतकाच्या अंताबरोबर या साऱ्या जुन्या खोडांचाही अंत होईल. आज<noinclude></noinclude>
boxwf6d81scq7dkyphaaujbvrt6lavk
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८८
104
66753
233076
151959
2026-07-11T12:44:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233076
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८३ }}
{{rule}}</noinclude>माझ्या या मतांबद्दल पाश्चात्त्य राष्ट्रातून टीकेचा भडिमार मजवर होत आहे. जगांत पाप नाही हे माझे मत सैतानी आहे असेही म्हणणारे लोक तिकडे पुष्कळ आहेत. ठीक आहे. पण निश्चयाने त्रिवार सांगतों की याच टीकाकारांचे वंशज मजवर स्तुतीचा वर्षाव करतील. मनुष्यप्राणी स्वभावतः पुण्यमय आहे हे लोकांस पटविणे हेच माझें कार्य आहे. जगांत कोणीही पापी नाहीं, हाच संदेश मला जगाला सांगावयाचा आहे. अंधकाराच्या दूतापेक्षा प्रकाशाचा दूत म्हणवून घेण्यांत मला अधिक भूषण वाटते.<br>
{{gap}}हे विश्व बाह्यतः विस्कळित दिसत असले तरी त्याच्या अंतर्यामी पूर्ण एकतानता आहे, आणि एकाच ग्रंथींत तें पक्के बांधले गेले आहे, हा आमचा दुसरा सिद्धांत पाश्चात्त्यांच्या गळी उतरवावयाचा आहे. परस्परांपासून परस्परांचे भिन्नत्व दाखविणाऱ्या जुन्या रेषा आतां अंधुक होत असून थोड्याच काळांत त्यांचा मागमूसही उरावयाचा नाही, अशी चिन्हें आतां स्पष्ट दिसत आहेत. वीज आणि वाफ ही साधनें दूरदूरच्या टोकांस आतां एकमेकांजवळ आणीत आहेत आणि यामुळे दूरदूरच्या देशांतील माणसांचे दळणवळण वाढत आहे. आपल्या देशाच्या हद्दीच्या बाहेर भुताखेतांची आणि समंधांची वस्ती नाही, हे आपणास आतां अनुभवाने कळू लागले आहे. तसेंच युरोपाबाहेर फक्त नरभक्षक लोक राहतात, हा युरोपीयांचा समजही अगदी खोटा आहे हे त्यांस कळू लागले आहे. आपला देश सोडून आपण परदेशांत प्रवेश केला म्हणजे तेथेही आपल्याचसारख्या आपल्या बांधवांचा वास आहे असें आप- णास आढळून येऊ लागते. आपणास मदत करावयास तेथे शेकडों हात पुढे सरतात. येथल्याप्रमाणेच तेथेही शेंकडों मुखें आपणांस आशीर्वाद देतात. फार काय पण आपल्या देशांत दृष्टीस पडावयाची नाहीत, अशी परोपकारी माणसें तेथें आपणास आढळतात. त्याचप्रमाणे परकी लोक येथे आले म्हणजे येथेही त्यांच्याच देशांतील बांधव त्यांना आढळतात. मनुष्यस्वभाव येथून तेथवर एकसारखाच आहे. मग कृत्रिम सरहद्दींनी त्याच्यांत फरक कसा पडणार?<br>
{{gap}}आपले अज्ञान हेच आपल्या साऱ्या दुःखांचे मूळ आहे असे आपली उपनिषदें म्हणतात; आणि ही गोष्ट सर्वथा खरी आहे असा अनुभवही आप.<noinclude></noinclude>
r5r5vgomutavfku61aks2lplakvl1xg
233083
233076
2026-07-12T06:20:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233083
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८३ }}
{{rule}}</noinclude>माझ्या या मतांबद्दल पाश्चात्त्य राष्ट्रातून टीकेचा भडिमार मजवर होत आहे. जगांत पाप नाही हे माझे मत सैतानी आहे असेही म्हणणारे लोक तिकडे पुष्कळ आहेत. ठीक आहे. पण निश्चयाने त्रिवार सांगतों की याच टीकाकारांचे वंशज मजवर स्तुतीचा वर्षाव करतील. मनुष्यप्राणी स्वभावतः पुण्यमय आहे हे लोकांस पटविणे हेच माझें कार्य आहे. जगांत कोणीही पापी नाहीं, हाच संदेश मला जगाला सांगावयाचा आहे. अंधकाराच्या दूतापेक्षा प्रकाशाचा दूत म्हणवून घेण्यांत मला अधिक भूषण वाटते.<br>
{{gap}}हे विश्व बाह्यतः विस्कळित दिसत असले तरी त्याच्या अंतर्यामी पूर्ण एकतानता आहे, आणि एकाच ग्रंथींत तें पक्के बांधले गेले आहे, हा आमचा दुसरा सिद्धांत पाश्चात्त्यांच्या गळी उतरवावयाचा आहे. परस्परांपासून परस्परांचे भिन्नत्व दाखविणाऱ्या जुन्या रेषा आतां अंधुक होत असून थोड्याच काळांत त्यांचा मागमूसही उरावयाचा नाही, अशी चिन्हें आतां स्पष्ट दिसत आहेत. वीज आणि वाफ ही साधनें दूरदूरच्या टोकांस आतां एकमेकांजवळ आणीत आहेत आणि यामुळे दूरदूरच्या देशांतील माणसांचे दळणवळण वाढत आहे. आपल्या देशाच्या हद्दीच्या बाहेर भुताखेतांची आणि समंधांची वस्ती नाही, हे आपणास आतां अनुभवाने कळू लागले आहे. तसेंच युरोपाबाहेर फक्त नरभक्षक लोक राहतात, हा युरोपीयांचा समजही अगदी खोटा आहे हे त्यांस कळू लागले आहे. आपला देश सोडून आपण परदेशांत प्रवेश केला म्हणजे तेथेही आपल्याचसारख्या आपल्या बांधवांचा वास आहे असें आपणास आढळून येऊ लागते. आपणास मदत करावयास तेथे शेकडों हात पुढे सरतात. येथल्याप्रमाणेच तेथेही शेंकडों मुखें आपणांस आशीर्वाद देतात. फार काय पण आपल्या देशांत दृष्टीस पडावयाची नाहीत, अशी परोपकारी माणसें तेथें आपणास आढळतात. त्याचप्रमाणे परकी लोक येथे आले म्हणजे येथेही त्यांच्याच देशांतील बांधव त्यांना आढळतात. मनुष्यस्वभाव येथून तेथवर एकसारखाच आहे. मग कृत्रिम सरहद्दींनी त्याच्यांत फरक कसा पडणार?<br>{{gap}}आपले अज्ञान हेच आपल्या साऱ्या दुःखांचे मूळ आहे असे आपली उपनिषदें म्हणतात; आणि ही गोष्ट सर्वथा खरी आहे असा अनुभवही आप-<noinclude></noinclude>
bhcxgie7s0ps6vaonc69xmuo29dnydb
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१८९
104
66754
233077
151961
2026-07-11T12:44:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233077
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१८४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>गास येतो. संसारांत काय किंवा परमार्थात काय, अज्ञान हेच आपल्या दुःखांचे मूळ आहे. केवळ अज्ञानामुळेच एकमेकांचा द्वेष आपण करीत असतो. दोघांच्याही अंगीं सारखंच अज्ञान असल्यामुळे, ते दोघे एकमेकांस जाणूं शकत नाहीत आणि यामुळेच त्या दोघांत प्रेमभाव वसत नाही. पर- स्परांची बरोबर ओळख झाली की तेथें प्रेम उत्पन्न होते, आणि असे होणे अपरिहार्यच आहे. आपण खरे वस्तुतः एकरूपच आहों. अज्ञानामुळे एक- मेकांची ओळख विसरल्याने प्रेमही नाहीसे झाले. पण ही ओळख पट- तांच प्रेमही उद्भवावें हे योग्यच होय. अशा रीतीने साऱ्या जगभर दळण- वळण वाढत जाऊन ही गेलेली ओळख पुन्हां पटू लागली आहे. एकीकडे राष्ट्राराष्ट्रांत तंटे सुरू असतां दुसरीकडे ही एकीकरणाची चळवळ अव्याहत सुरू आहे. राजकारण आणि सामाजिक बाबी यांचीही गोष्ट आज अशीच झाली आहे. जे प्रश्न पूर्वी एखाद्याच राष्ट्राच्या हिताहिताच्या दृष्टीने सोडवावयाचे असत, तेच प्रश्न आता आंतर्राष्ट्रीय होऊन बसले आहेत. एखाद्या राष्ट्रातील राजकारणाच्या बाबींची वासलात लावतांना इतर राष्ट्रे काय म्हणतील आणि आपल्या कृतीचा परिणाम इतर राष्ट्रांवर काय होईल, याचा विचार त्या रा ष्ट्राला आतां करावा लागतो. पूर्वीच्या प्रश्नांनी आपले एकदेशित्व सोडले असून ते आतां जगद्व्यपी होऊन बसले आहेत. जगांतील सर्व राष्ट्रांच्या सल्लयाशिवाय त्यांचा समाधानकारक निकाल लागणे मुष्किलीचे झाले आहे. सर्व राष्ट्रीय कायदे, सर्व राष्ट्रांची जूट, सर्व राष्ट्रांची संघटना या शब्दांचा उच्चार आतां जागोजाग होऊ लागला आहे. मनुष्यजाति वस्तुतः एकरूप आहे, हेच या साऱ्या चळवळीचे रहस्य आहे. भौतिक शास्त्रेही या वस्तुजा तासंबंधी अधिक उदार होत चालली आहेत. या साऱ्या विविधतेच्या पोटांत कोठेतरी एकतानता असावी असे त्यांस आतां वाढू लागले आहे. हे सारें विश्व म्हणजे एकच जड वस्तु असून तुम्ही, मी, चंद्र, सूर्य, तारे आणि बाकीचे सारे पदार्थ हे त्या एकाच प्रचंड जड वस्तूच्या लहान लहान विभागां- प्रमाणे आहों. या अफाट जड समुद्रावर तुम्ही आम्ही लहान लहान तरंगांसारखे चलनवलन करीत आहो. ही जड सृष्टि सोडून मानसिक सृष्टीकडे आपण वळलों तरी तेथें हाच प्रकार आहे. आपले विचार म्हणजे विश्वविचारसाग- रावरील तरंग होत. त्याचप्रमाणे आपली चैतन्यरूपें हीसुद्धा त्या आत्मसमु-<noinclude></noinclude>
jgejkcmk0c79umo76n8no3tfufxoo0x
233084
233077
2026-07-12T06:24:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233084
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>णास येतो. संसारांत काय किंवा परमार्थात काय, अज्ञान हेच आपल्या दुःखांचे मूळ आहे. केवळ अज्ञानामुळेच एकमेकांचा द्वेष आपण करीत असतो. दोघांच्याही अंगीं सारखंच अज्ञान असल्यामुळे, ते दोघे एकमेकांस जाणूं शकत नाहीत आणि यामुळेच त्या दोघांत प्रेमभाव वसत नाही. परस्परांची बरोबर ओळख झाली की तेथें प्रेम उत्पन्न होते, आणि असे होणे अपरिहार्यच आहे. आपण खरे वस्तुतः एकरूपच आहों. अज्ञानामुळे एकमेकांची ओळख विसरल्याने प्रेमही नाहीसे झाले. पण ही ओळख पटतांच प्रेमही उद्भवावें हे योग्यच होय. अशा रीतीने साऱ्या जगभर दळण-वळण वाढत जाऊन ही गेलेली ओळख पुन्हां पटू लागली आहे. एकीकडे राष्ट्राराष्ट्रांत तंटे सुरू असतां दुसरीकडे ही एकीकरणाची चळवळ अव्याहत सुरू आहे. राजकारण आणि सामाजिक बाबी यांचीही गोष्ट आज अशीच झाली आहे. जे प्रश्न पूर्वी एखाद्याच राष्ट्राच्या हिताहिताच्या दृष्टीने सोडवावयाचे असत, तेच प्रश्न आता आंतर्राष्ट्रीय होऊन बसले आहेत. एखाद्या राष्ट्रातील राजकारणाच्या बाबींची वासलात लावतांना इतर राष्ट्रे काय म्हणतील आणि आपल्या कृतीचा परिणाम इतर राष्ट्रांवर काय होईल, याचा विचार त्या राष्ट्राला आतां करावा लागतो. पूर्वीच्या प्रश्नांनी आपले एकदेशित्व सोडले असून ते आतां जगद्व्यापी होऊन बसले आहेत. जगांतील सर्व राष्ट्रांच्या सल्ल्याशिवाय त्यांचा समाधानकारक निकाल लागणे मुष्किलीचे झाले आहे. सर्व राष्ट्रीय कायदे, सर्व राष्ट्रांची जूट, सर्व राष्ट्रांची संघटना या शब्दांचा उच्चार आतां जागोजाग होऊ लागला आहे. मनुष्यजाति वस्तुतः एकरूप आहे, हेच या साऱ्या चळवळीचे रहस्य आहे. भौतिक शास्त्रेही या वस्तुजातासंबंधी अधिक उदार होत चालली आहेत. या साऱ्या विविधतेच्या पोटांत कोठेतरी एकतानता असावी असे त्यांस आतां वाढू लागले आहे. हे सारें विश्व म्हणजे एकच जड वस्तु असून तुम्ही, मी, चंद्र, सूर्य, तारे आणि बाकीचे सारे पदार्थ हे त्या एकाच प्रचंड जड वस्तूच्या लहान लहान विभागांप्रमाणे आहों. या अफाट जड समुद्रावर तुम्ही आम्ही लहान लहान तरंगांसारखे चलनवलन करीत आहो. ही जड सृष्टि सोडून मानसिक सृष्टीकडे आपण वळलों तरी तेथें हाच प्रकार आहे. आपले विचार म्हणजे विश्वविचारसागरावरील तरंग होत. त्याचप्रमाणे आपली चैतन्यरूपें हीसुद्धा त्या आत्मसमु-<noinclude></noinclude>
6jl0e387tj2v42v0ptcx4jh4d8sacgp
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९०
104
66755
233078
151966
2026-07-11T12:44:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233078
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८५ }}
{{rule}}</noinclude>द्रावरील तरंगांसारखी आहेत. या आत्मसमुद्राचे स्वरूप अखंड आहे. तें कधी बदलत नाही. ते कधी लहानमोठे होत नाही. तें सर्वदा एकरूप असते. <br>
{{gap}}अहो, मुलांना नैतिक शिक्षण द्या अशी ओरड अलीकडे सर्वत्र ऐकू येते. पण नीतीचा मूळ झरा आमच्या जुन्या ग्रंथांत आहे, याचा विचार कोणीच करीत नाही. या मूळ झ-याचे पाणी पिण्यासाठी सारे जग आज उत्सुक होऊन बसले आहे. त्याची अतिशय तहान त्याला लागली आहे. ही तहान स्याला भागवावयाची असेल, तर आमच्या उपनिषदांकडेच त्याने धांव घेतली पाहिजे. <br>
{{gap}}आतां आम्हां हिंदी लोकांस कशाची जरूर आहे, याचाही विचार करणे भाग आहे. आपणालाही याच गोष्टीची वास्तविक जरूर आहे. परकीयांना ही जरूर एकपट असेल, तर आम्हाला त्यांची जरूर शतपट अधिक आहे. उपनिषदें म्हणजे जीवनदायी अमृताचा सागर आहे. आमचे पूर्वज महान् ऋषी होते असा अभिमान आम्ही वाहतो. या साऱ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. तथापि इतरांच्या मानाने पाहतां सांप्रत आपण दुबळे-फारच दुबळे आहोत हे तुमच्या तोंडावर स्पष्टपणे तुम्हांस मला सांगितले पाहिजे. आधी आमचे शरीरबळ इतरांच्या मानाने कमी. या शरीरदौर्बल्यामुळेच अनेक दुःखें आपणावर कोसळतात. आपणांस भोगाव्या लागणाऱ्या यातनांपैकी किमानपक्ष तिसरा हिस्सा तरी याच दुबळेपणामुळे उत्पन्न झालेला आहे. शरिराच्या दुबळेपणाने अंगांत आळस भरतो. काम करण्याची हुरूप राहत नाही. मग मन दुबळे होऊ लागते. चार माणसेंसुद्धा सुखाने एकत्र नांदे- नाशी होतात. मग मोठ्या संघाची आणि संघटनात्मक कार्याची गोष्ट कशाला बोलावी? कोणाला कोणाबद्दल आदर अथवा प्रेम नाही. आपण शुद्ध स्वा र्थांचे पुतळे बनलो आहों. एखाद्या कार्यासाठी तीन माणसें जरी एकत्र जमलीं तरी आरंभापासूनच परस्परांचा द्वेष ती करीत असतात. त्यांपैकी प्रत्येकाला सगळा लाडू हवा असतो; इतकेच नाही तर दुसऱ्याला भाकरीचा तुकडाही मिळू नये अशी त्याची इच्छा असते. मग परस्पर मत्सराला काय तोटा? आज आम्ही अशा प्रकारच्या स्थितीत पडलो आहों. कसल्याही प्रकारची संघटना नसलेल्या बाजारबुणग्यासारखी आपली स्थिति आहे. फाटाफूट झालेल्या असल्या घोळक्यांत संघशक्ति कधी काळी उत्पन्न होईल अशी<noinclude></noinclude>
kcu1dtbwhvbnmut23d4gcw962t3u7ox
233085
233078
2026-07-12T06:26:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233085
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८५ }}
{{rule}}</noinclude>द्रावरील तरंगांसारखी आहेत. या आत्मसमुद्राचे स्वरूप अखंड आहे. तें कधी बदलत नाही. ते कधी लहानमोठे होत नाही. तें सर्वदा एकरूप असते.<br>{{gap}}अहो, मुलांना नैतिक शिक्षण द्या अशी ओरड अलीकडे सर्वत्र ऐकू येते. पण नीतीचा मूळ झरा आमच्या जुन्या ग्रंथांत आहे, याचा विचार कोणीच करीत नाही. या मूळ झऱ्याचे पाणी पिण्यासाठी सारे जग आज उत्सुक होऊन बसले आहे. त्याची अतिशय तहान त्याला लागली आहे. ही तहान त्याला भागवावयाची असेल, तर आमच्या उपनिषदांकडेच त्याने धांव घेतली पाहिजे.<br>{{gap}}आतां आम्हां हिंदी लोकांस कशाची जरूर आहे, याचाही विचार करणे भाग आहे. आपणालाही याच गोष्टीची वास्तविक जरूर आहे. परकीयांना ही जरूर एकपट असेल, तर आम्हाला त्यांची जरूर शतपट अधिक आहे. उपनिषदें म्हणजे जीवनदायी अमृताचा सागर आहे. आमचे पूर्वज महान् ऋषी होते असा अभिमान आम्ही वाहतो. या साऱ्या गोष्टी अगदी खऱ्या आहेत. तथापि इतरांच्या मानाने पाहतां सांप्रत आपण दुबळे- फारच दुबळे आहोत हे तुमच्या तोंडावर स्पष्टपणे तुम्हांस मला सांगितले पाहिजे. आधी आमचे शरीरबळ इतरांच्या मानाने कमी. या शरीरदौर्बल्यामुळेच अनेक दुःखें आपणावर कोसळतात. आपणांस भोगाव्या लागणाऱ्या यातनांपैकी किमानपक्ष तिसरा हिस्सा तरी याच दुबळेपणामुळे उत्पन्न झालेला आहे. शरिराच्या दुबळेपणाने अंगांत आळस भरतो. काम करण्याची हुरूप राहत नाही. मग मन दुबळे होऊ लागते. चार माणसेंसुद्धा सुखाने एकत्र नांदेनाशी होतात. मग मोठ्या संघाची आणि संघटनात्मक कार्याची गोष्ट कशाला बोलावी? कोणाला कोणाबद्दल आदर अथवा प्रेम नाही. आपण शुद्ध स्वार्थांचे पुतळे बनलो आहों. एखाद्या कार्यासाठी तीन माणसें जरी एकत्र जमलीं तरी आरंभापासूनच परस्परांचा द्वेष ती करीत असतात. त्यांपैकी प्रत्येकाला सगळा लाडू हवा असतो; इतकेच नाही तर दुसऱ्याला भाकरीचा तुकडाही मिळू नये अशी त्याची इच्छा असते. मग परस्पर मत्सराला काय तोटा? आज आम्ही अशा प्रकारच्या स्थितीत पडलो आहों. कसल्याही प्रकारची संघटना नसलेल्या बाजारबुणग्यासारखी आपली स्थिति आहे. फाटाफूट झालेल्या असल्या घोळक्यांत संघशक्ति कधी काळी उत्पन्न होईल अशी<noinclude></noinclude>
0rp47733ck6v8xmbzd9es4crpinhn61
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९१
104
66756
233079
151971
2026-07-11T12:44:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233079
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१८६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>आशाही आजच्या स्थितीत दिसत नाही. यांच्यांतल्या प्रत्येकांत स्वार्थ भर लेला आहे; मग यांचा संघ बनणार कसा? आपापल्या स्वार्थासाठी प्रत्येकानें दुसऱ्याशी लढावें असा प्रकार आज शतकानुशतकें चालू आहे. गंध आडवें लावावें की उभे लावावें असल्या जाड्या विषयांवर कडाक्याचे वाद अजू नही चालतात! कोणाची नजर पडली असतां अन्न विटाळते हे सिद्ध कर ण्यासाठी बैलाच्या ओझ्याचे ग्रंथ लिहिणारे बहाद्दर आजही आहेत! गेली कित्येक शतकें आमचा धंदा म्हटला तर हाच. असल्या प्रकारचे बडे शोध लावण्यांत आणि त्याच दर्जाचे कूट प्रश्न सोडविण्यांत ज्यांच्या मेंदूची सर्व शक्ति खर्च होते असल्या नरवीरांपासून अधिक कशाची अपेक्षा आम्ही करावी? असल्या प्रकारच्या गोष्टी करण्यांत आयुष्याची इति कर्तव्यता आहे असे समजणे लाजिरवाणें नाहीं काय? होय. असल्या प्रकाराबद्दल आम्हांस कधी कधी लाज वाटते खरी, पण ती वाटून उपयोग काय? या वस्तूंची मगरमिठी आमच्याने सोडवत नाही. आम्हांला पुष्कळ गोष्टी कराव्याशा वाटतात; पण एकही आमच्या हातून होत मात्र नाही. काही करण्याचे नुसते मनसुबे करावे आणि हाताने काहीच करूं नये अशी संवयच आम्हांस लागून गेली आहे. आपण तोंडाने काय बडबडतों याचा अर्थ पोपटाला जसा कळत नाही, त्याचप्रमाणे आम्हांलाही जणूं काय आमच्या बड- बडीचा अर्थ कळत नाही. असल्या परिस्थितीचे कारण काय? आमचे शरीरदौर्बल्य हेच. असल्या दुबळ्या मेंदूत कर्तृत्वाची जाणीव उत्पन्नच होत नाही. याकरितां शरीरबळाकडे आपण आधी लक्ष्य दिले पाहिजे. आमच्या तरुणांनी आधी सुदृढ बनले पाहिजे. धर्म वगैरे बाकीच्या सा-या गोष्टी मग सावकाश पाहता येतील. माझ्या तरुण मित्रांनो, आधी तुम्ही सारे भीम बना. तुम्हांला माझा पहिला उपदेश हाच आहे. गीतेच्या अभ्यासापेक्षा फुटबालच्या खेळानें कैवल्यधामाचा रस्ता आम्हांस अधिक सुलभ होईल. माझे हे शब्द फाजील धाष्टांचे आहेत; पण मी तरी काय करूं? तुमच्या- वरील माझें प्रेम हे शब्द माझ्या तोंडून वदवितें. गीतेचा खरा अर्थ तुमच्या मनगटाची रुंद कांब तुम्हांस अधिक चांगला समजावून देईल. तुमचे दंड पिळदार होऊन भरपूर रक्त तुमच्या नाड्यातून सळसळू लागले म्हणजे भग वान् श्रीकृष्णाच्या प्रचंड शक्तीची आणि अगाध बुद्धिमत्तेची खरी साक्ष<noinclude></noinclude>
bemllqt5mmem7q9d3a2sxi0gxipjamq
233086
233079
2026-07-12T06:30:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233086
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>आशाही आजच्या स्थितीत दिसत नाही. यांच्यांतल्या प्रत्येकांत स्वार्थ भरलेला आहे; मग यांचा संघ बनणार कसा? आपापल्या स्वार्थासाठी प्रत्येकानें दुसऱ्याशी लढावें असा प्रकार आज शतकानुशतकें चालू आहे. गंध आडवें लावावें की उभे लावावें असल्या जाड्या विषयांवर कडाक्याचे वाद अजूनही चालतात! कोणाची नजर पडली असतां अन्न विटाळते हे सिद्ध करण्यासाठी बैलाच्या ओझ्याचे ग्रंथ लिहिणारे बहाद्दर आजही आहेत! गेली कित्येक शतकें आमचा धंदा म्हटला तर हाच. असल्या प्रकारचे बडे शोध लावण्यांत आणि त्याच दर्जाचे कूट प्रश्न सोडविण्यांत ज्यांच्या मेंदूची सर्व शक्ति खर्च होते असल्या नरवीरांपासून अधिक कशाची अपेक्षा आम्ही करावी? असल्या प्रकारच्या गोष्टी करण्यांत आयुष्याची इति कर्तव्यता आहे असे समजणे लाजिरवाणें नाहीं काय? होय. असल्या प्रकाराबद्दल आम्हांस कधी कधी लाज वाटते खरी, पण ती वाटून उपयोग काय? या वस्तूंची मगरमिठी आमच्याने सोडवत नाही. आम्हांला पुष्कळ गोष्टी कराव्याशा वाटतात; पण एकही आमच्या हातून होत मात्र नाही. काही करण्याचे नुसते मनसुबे करावे आणि हाताने काहीच करूं नये अशी संवयच आम्हांस लागून गेली आहे. आपण तोंडाने काय बडबडतों याचा अर्थ पोपटाला जसा कळत नाही, त्याचप्रमाणे आम्हांलाही जणूं काय आमच्या बडबडीचा अर्थ कळत नाही. असल्या परिस्थितीचे कारण काय? आमचे शरीरदौर्बल्य हेच. असल्या दुबळ्या मेंदूत कर्तृत्वाची जाणीव उत्पन्नच होत नाही. याकरितां शरीरबळाकडे आपण आधी लक्ष्य दिले पाहिजे. आमच्या तरुणांनी आधी सुदृढ बनले पाहिजे. धर्म वगैरे बाकीच्या साऱ्या गोष्टी मग सावकाश पाहता येतील. माझ्या तरुण मित्रांनो, आधी तुम्ही सारे भीम बना. तुम्हांला माझा पहिला उपदेश हाच आहे. गीतेच्या अभ्यासापेक्षा फुटबालच्या खेळानें कैवल्यधामाचा रस्ता आम्हांस अधिक सुलभ होईल. माझे हे शब्द फाजील धार्ष्टांचे आहेत; पण मी तरी काय करूं? तुमच्यावरील माझें प्रेम हे शब्द माझ्या तोंडून वदवितें. गीतेचा खरा अर्थ तुमच्या मनगटाची रुंद कांब तुम्हांस अधिक चांगला समजावून देईल. तुमचे दंड पिळदार होऊन भरपूर रक्त तुमच्या नाड्यातून सळसळू लागले म्हणजे भगवान् श्रीकृष्णाच्या प्रचंड शक्तीची आणि अगाध बुद्धिमत्तेची खरी साक्ष<noinclude></noinclude>
20j8ftjc3gpjqr76jrc8bi0n8mhdbkr
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९२
104
66757
233080
151972
2026-07-11T12:44:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233080
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{RunningHeader|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८७ }}
{{rule}}</noinclude>तुम्हांस पटेल. चालतांना भूमीलाही नमविण्याचे सामर्थ्य तुमच्या तंगड्यांत आले म्हणजे उपनिषदांचा अर्थ तुम्हांस अधिक चांगला कळू लागेल. या सर्व गोष्टी होण्यास तुमच्या अंगी आधी पौरुष खेळले पाहिजे. आमच्या गरजा काय आहेत याचा विचार आधी करून मग पुढील मार्गाची तरतूद आपणास लावावयाची आहे. <br>
{{gap}}मी वेदान्ताचा उपदेश करतो म्हणून कित्येक लोक माझा तिरस्कार करीत असतात. द्वैत, अद्वैत अथवा दुसरे कोणतेही मत लोकांस सांगण्याची माझी इच्छा नाही. एखाद्या विशिष्ट मताचा प्रसार करावा अथवा एखादें मत खोडून काढावे, असा हेतु माझ्या मनांत कधीच नव्हता. आत्मा सच्चिदानं रूप आहे एवढेच मला सर्वांस सांगावयाचे आहे; आणि वास्तविक पाहतां सध्याच्या काळी एवढयाच धर्माची जरूर आपणांस आहे. मला एखादें मूल असते तर 'तत्त्वमसि' हे सूत्र त्याच्या जन्मापासून त्याच्या कानांत मी ओरडत राहिलो असतो. राणी मदालसेची कथा पुराणांत तुम्ही वाचली असेलच. आपलें तान्हें मूल पाळण्यात घालून ती हालवीत असतां, "तूं पवित्र, निष्कलंक, सर्वशक्तिमान् आहेस' अशा अर्थाचे गीत ती म्हणत असे. या कथेत फार तात्पर्य भरलेले आहे. 'अहं ब्रह्मास्मि' असें चिंतन मनःपूर्वक तुम्ही केले तर तुम्ही खरोखरच ब्रह्मरूप व्हाल. साऱ्या जगभर मी फिरलों आणि अनुभव घेतला तो हाच. मनुष्यप्राणी पापी आहे असें पाश्चात्य लोक तोंडाने म्हणोत; पण तशी त्यांची श्रद्धा मात्र खास नाही. आपण पापी आहों असें इंग्रज लोकांस मनापासून वाटले असते, तर त्यांची योग्यता मध्य आफ्रिकेंतील शिद्यांहून अधिक असतीना. त्यांचा तसा विश्वास नाहीं ही परमेश्वराची त्यांजवर मोठी कृपाच होय. आपण पापी, आपण क्षुद्र असें इंग्रज लोकांस स्वप्नांतही वाटत नाहीं; एवढेच नव्हे, तर उलट आपण जगाचे धनी आहों असें त्यांना वाटते. जगाचे धनीपण जन्मादारभ्यच आपणास प्राप्त झाले आहे, अशी त्यांची भावना आहे. 'कतुमकर्तुम्' शक्ति आपल्या अंगी असून, वाटेल तशी जगाची घडामोड आपण करू शकू असें त्यांस वाटते. उद्यां चंद्रसूर्यावर जाण्याची इच्छा झाली तरी तेसुद्धा आपण करूं असा त्यांचा विश्वास आहे. या श्रद्धेमुळेच इंग्रजांचे राष्ट्र आज मोठे बनले आहे. मनुष्यप्राणी दुबळा आणि पापी आहे असें ख्रिस्ती धर्मोपदेशक<noinclude></noinclude>
pzr21e0jm1pykdihmuloucy3j7h48cp
233087
233080
2026-07-12T06:33:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233087
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८७ }}
{{rule}}</noinclude>तुम्हांस पटेल. चालतांना भूमीलाही नमविण्याचे सामर्थ्य तुमच्या तंगड्यांत आले म्हणजे उपनिषदांचा अर्थ तुम्हांस अधिक चांगला कळू लागेल. या सर्व गोष्टी होण्यास तुमच्या अंगी आधी पौरुष खेळले पाहिजे. आमच्या गरजा काय आहेत याचा विचार आधी करून मग पुढील मार्गाची तरतूद आपणास लावावयाची आहे.<br>{{gap}}मी वेदान्ताचा उपदेश करतो म्हणून कित्येक लोक माझा तिरस्कार करीत असतात. द्वैत, अद्वैत अथवा दुसरे कोणतेही मत लोकांस सांगण्याची माझी इच्छा नाही. एखाद्या विशिष्ट मताचा प्रसार करावा अथवा एखादें मत खोडून काढावे, असा हेतु माझ्या मनांत कधीच नव्हता. आत्मा सच्चिदानंरूप आहे एवढेच मला सर्वांस सांगावयाचे आहे; आणि वास्तविक पाहतां सध्याच्या काळी एवढ्याच धर्माची जरूर आपणांस आहे. मला एखादें मूल असते तर 'तत्त्वमसि' हे सूत्र त्याच्या जन्मापासून त्याच्या कानांत मी ओरडत राहिलो असतो. राणी मदालसेची कथा पुराणांत तुम्ही वाचली असेलच. आपलें तान्हें मूल पाळण्यात घालून ती हालवीत असतां, 'तूं पवित्र, निष्कलंक, सर्वशक्तिमान् आहेस' अशा अर्थाचे गीत ती म्हणत असे. या कथेत फार तात्पर्य भरलेले आहे. 'अहं ब्रह्मास्मि' असें चिंतन मनःपूर्वक तुम्ही केले तर तुम्ही खरोखरच ब्रह्मरूप व्हाल. साऱ्या जगभर मी फिरलों आणि अनुभव घेतला तो हाच. मनुष्यप्राणी पापी आहे असें पाश्चात्य लोक तोंडाने म्हणोत; पण तशी त्यांची श्रद्धा मात्र खास नाही. आपण पापी आहों असें इंग्रज लोकांस मनापासून वाटले असते, तर त्यांची योग्यता मध्य आफ्रिकेंतील शिद्यांहून अधिक असतीना. त्यांचा तसा विश्वास नाहीं ही परमेश्वराची त्यांजवर मोठी कृपाच होय. आपण पापी, आपण क्षुद्र असें इंग्रज लोकांस स्वप्नांतही वाटत नाहीं; एवढेच नव्हे, तर उलट आपण जगाचे धनी आहों असें त्यांना वाटते. जगाचे धनीपण जन्मादारभ्यच आपणास प्राप्त झाले आहे, अशी त्यांची भावना आहे. 'कतुमकर्तुम्' शक्ति आपल्या अंगी असून, वाटेल तशी जगाची घडामोड आपण करू शकू असें त्यांस वाटते. उद्यां चंद्रसूर्यावर जाण्याची इच्छा झाली तरी तेसुद्धा आपण करूं असा त्यांचा विश्वास आहे. या श्रद्धेमुळेच इंग्रजांचे राष्ट्र आज मोठे बनले आहे. मनुष्यप्राणी दुबळा आणि पापी आहे असें ख्रिस्ती धर्मोपदेशक<noinclude></noinclude>
jtcydrtjbji7ke1wtcqq0lhrb95xp0w
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९३
104
66758
233081
151976
2026-07-11T12:44:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233081
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१८८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>त्यांना सांगत असतात. उपाध्यायांच्या या वचनावर इंग्रज लोकांनी खरो- खर विश्वास ठेवला असता, तर आजची त्यांची स्थिति त्यांना कधीही प्राप्त झाली नसती. युरोपांतील इतर देशांची स्थितिही अशीच आहे. ख्रिस्ती उपदेशक अनेक प्रकारच्या भोळ्या गोष्टी त्यांना सांगत असतात. तथापि त्यांचे श्रोते आपल्या मनावर असल्या भाकडकथांचा परिणाम मुळीच होऊ देत नाहीत, आणि आपलें ईश्वरत्वही ते कधी विसरत नाहीत. हे ईश्वरत्व त्यांच्या ठिकाणी अद्यापि जिवंत आहे आणि आपल्या जिवंतपणाची साक्षही तें पटविते. आपली स्थिति याच्या उलट आहे. आपली आत्मश्रद्धा नाहींशी झाली आहे. माझे म्हणणे तुम्हांला कदाचित् खोटे वाटेल, पण मी निश्च याने सांगतों की इंग्रजांपेक्षा आपला आत्मविश्वास फारच हलक्या प्रतीचा आहे. या बाबींत इंग्रज लोक आपणांहून हजार पटीने अधिक श्रेष्ठ आहेत. माझे हे शब्द तुम्हांस कडू लागत असतील; पण काय करावें, खरे आहे तें मला बोललेच पाहिजे. इंग्रज लोकांत धैर्य किती आहे, याचा प्रत्यय आप णांस नेहमी येत नाही काय? आपली धर्मतत्त्वे एखाद्या इंग्रजांला पटलीं की त्यांचा प्रसार करण्याचे वेडच जणूं काय त्यांना लागते. आपले घरदार सोडून ते येथे येतात आणि आमच्याच तत्त्वांचा उपदेश आम्हांस करूं लागतात. या त्यांच्या कृतीबद्दल त्यांच्या देशबांधवांनी त्यांची टर उडविली तरी तिकडे ते लक्ष्य देत नाहीत. तुमच्यापैकी किती जणांच्या हातून असें काम होईल? असली कामगिरी उचलणारा मनुष्य तुमच्यांत सहसा मिळा- वयाचा नाही. असें कां? काय, तुमची धर्मतत्त्वें तुम्हांस अवगत नाहीत? या बाबींत तुमचे ज्ञान त्यांच्याहून खास अधिक आहे. किंबहुना, तुमचें फाजील शहाणपणच तुम्हांस नडतें. वाजवीहून अधिक शहाणे तुम्ही आहां हेच तुमचे मोठे दुर्दैव आहे. याचे कारण हेंच की तुमचें रक्त पाण्यासारखें पातळ आहे. तुमचा मेंदू शिथिल झाला आहे आणि तुमचा देह अशक्त आहे. यांत आता तुम्ही बदल केला पाहिजे. दुबळ्या देहामुळेच सांप्रतचे कष्ट तुम्ही भोगीत आहा. तुमच्या साऱ्या अधोगतीचे कारण तुमचे देहदौ बल्य हे एकच आहे. सुधारणांच्या गोष्टी तुम्ही तोंडाने सांगतां. आमचे ध्येय अमुक आहे अशी बडबड तुम्ही करता. गेली शंभर वर्षे बडबडीवां चून दुसरे कांहींच तुम्ही केले नाही. कृतीची वेळ आली तेव्हा तुम्ही अशी<noinclude></noinclude>
3ivbhl9y8xx723u6smqolvwq3hk7b8u
233088
233081
2026-07-12T06:35:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233088
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>त्यांना सांगत असतात. उपाध्यायांच्या या वचनावर इंग्रज लोकांनी खरोखर विश्वास ठेवला असता, तर आजची त्यांची स्थिति त्यांना कधीही प्राप्त झाली नसती. युरोपांतील इतर देशांची स्थितिही अशीच आहे. ख्रिस्ती उपदेशक अनेक प्रकारच्या भोळ्या गोष्टी त्यांना सांगत असतात. तथापि त्यांचे श्रोते आपल्या मनावर असल्या भाकडकथांचा परिणाम मुळीच होऊ देत नाहीत, आणि आपलें ईश्वरत्वही ते कधी विसरत नाहीत. हे ईश्वरत्व त्यांच्या ठिकाणी अद्यापि जिवंत आहे आणि आपल्या जिवंतपणाची साक्षही तें पटविते. आपली स्थिति याच्या उलट आहे. आपली आत्मश्रद्धा नाहींशी झाली आहे. माझे म्हणणे तुम्हांला कदाचित् खोटे वाटेल, पण मी निश्चयाने सांगतों की इंग्रजांपेक्षा आपला आत्मविश्वास फारच हलक्या प्रतीचा आहे. या बाबींत इंग्रज लोक आपणांहून हजार पटीने अधिक श्रेष्ठ आहेत. माझे हे शब्द तुम्हांस कडू लागत असतील; पण काय करावें, खरे आहे तें मला बोललेच पाहिजे. इंग्रज लोकांत धैर्य किती आहे, याचा प्रत्यय आपणांस नेहमी येत नाही काय? आपली धर्मतत्त्वे एखाद्या इंग्रजांला पटलीं की त्यांचा प्रसार करण्याचे वेडच जणूं काय त्यांना लागते. आपले घरदार सोडून ते येथे येतात आणि आमच्याच तत्त्वांचा उपदेश आम्हांस करूं लागतात. या त्यांच्या कृतीबद्दल त्यांच्या देशबांधवांनी त्यांची टर उडविली तरी तिकडे ते लक्ष्य देत नाहीत. तुमच्यापैकी किती जणांच्या हातून असें काम होईल? असली कामगिरी उचलणारा मनुष्य तुमच्यांत सहसा मिळावयाचा नाही. असें कां? काय, तुमची धर्मतत्त्वें तुम्हांस अवगत नाहीत? या बाबींत तुमचे ज्ञान त्यांच्याहून खास अधिक आहे. किंबहुना, तुमचें फाजील शहाणपणच तुम्हांस नडतें. वाजवीहून अधिक शहाणे तुम्ही आहां हेच तुमचे मोठे दुर्दैव आहे. याचे कारण हेंच की तुमचें रक्त पाण्यासारखें पातळ आहे. तुमचा मेंदू शिथिल झाला आहे आणि तुमचा देह अशक्त आहे. यांत आता तुम्ही बदल केला पाहिजे. दुबळ्या देहामुळेच सांप्रतचे कष्ट तुम्ही भोगीत आहा. तुमच्या साऱ्या अधोगतीचे कारण तुमचे देहदौर्बल्य हे एकच आहे. सुधारणांच्या गोष्टी तुम्ही तोंडाने सांगतां. आमचे ध्येय अमुक आहे अशी बडबड तुम्ही करता. गेली शंभर वर्षे बडबडीवांचून दुसरे कांहींच तुम्ही केले नाही. कृतीची वेळ आली तेव्हा तुम्ही अशी<noinclude></noinclude>
pc90ivtyfz0f9xd83rqikmjnz9jq20f
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९४
104
66759
233082
151980
2026-07-11T12:45:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233082
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८९ }}
{{rule}}</noinclude>दडी दिली की तुमचा शोधच कोठे लागेना. आपल्या अशा कृतींनी सा-या जगभर तुम्ही आपली छीःथू करून घेतली आहे. सुधारणा या शब्दाचा अर्थ- सुद्धा तुम्हीं नाहींसा करून टाकला. असें कां व्हावें? याचे कारण तुमच्या लक्ष्यांत येत नाही काय? या गोष्टी तुम्हांस समजत नाहीत असे नाही. यांतील कार्यकारणभाव तुम्हांस चांगला समजतो. आपलें दौर्बल्य आप णांस जेथें तेथें नडते. तुमचे शरीर अशक्त आणि मनही अशक्त. आत्म श्रद्धा कशी ती तुम्हांस ठाऊकच नाही. गेली कित्येक शतकें चालीरीतींच्या, जातिभेदाच्या, राजांच्या आणि परकीयांच्या अंमलाखाली तुम्ही निःसत्व बनून गेला आहां. माझ्या बंधूंनो, तुमच्याच जातभाईंनी तुमचे सत्वहरण केले आहे. तुमच्या पाठीचा कणा मोडून गेला आहे. पायाखाली सरपट—णाऱ्या किडयांच्या पंक्तीला तुम्ही गेलेले आहा. तुम्हांला सामर्थ्याची देणगी कोण देणार? मी तुम्हांला पुनःपुन्हां हेच सांगतों की बाबांनो, सुदृढ व्हा. आज आपणाला जर कोणत्या वस्तूची जरूर असेल तर ती शक्तीचीच आहे; आणि हे साधण्याकरितां 'अहं ब्रम्हास्मि' या मंत्राचा जप ही पहिली पायरी आहे. उपनिषदांचा अभ्यास करून हेच तत्व प्रथम मुखोद्गत करा. "मला शस्त्र कापू शकत नाही, अग्नि जाळू शकत नाही, वायू शोषू शकत नाही; मी सर्वशक्ति आहे." या मंगलमय मंत्राचा जप नित्य नित्य करीत जा. हाच तुमचा तारक मंत्र आहे. "मी दुर्बल, माझ्याने काय होणार?" अशी अक्षरेंसुद्धा तोंडावाटे कधी काढू नका. 'कर्तुमकर्तुम् अन्यथा कर्तुं' असे माझें सामर्थ्य आहे असे म्हणत जा. आपणाला करण्यास अशक्य असें या जगांत काय आहे? वाटेल ती गोष्ट आपण करूं. आत्मा सर्वशक्तिमान् आहे. पण या गोष्टीचा विसर आपणांस पडला आहे. आतां ही गेलेली श्रद्धा पुन्हां परत आणली पाहिजे. नाचिकेताची कथा ध्यानात आणा. बापाने यज्ञ केला तेव्हां नाचिकेताची श्रद्धा जागृत झाली. याच श्रद्धेची प्राप्ति आपणांपैकी प्रत्येकास प्राप्त झाली तर काय बहार होईल! तुमच्यापैकी प्रत्येक जण उठेल आणि जग हालवून सोडील. तुमचे अनंत परमात्मरूप व्यक्तदशेला येईल. असे व्हावे इतकीच माझी इच्छा आहे. हे सामर्थ्य आणि ही श्रद्धा या वस्तू उपनिषदांपासून तुह्मांस प्राप्त होणाऱ्या आहेत. <br>
{{gap}}पण इतके दिवस ही विद्या केवल संन्याशांच्या हाती राहिली होती. हे मोठे रहस्य त्यांनी गुप्त राखिले. हे रहस्य उराशी बाळगून ते अरण्यांत दडी देत. {{nop}}<noinclude></noinclude>
tlz1jkq2cpecgh3tl7aobmc38l6fyey
233089
233082
2026-07-12T06:38:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233089
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१८९ }}
{{rule}}</noinclude>दडी दिली की तुमचा शोधच कोठे लागेना. आपल्या अशा कृतींनी साऱ्या जगभर तुम्ही आपली छीःथू करून घेतली आहे. सुधारणा या शब्दाचा अर्थसुद्धा तुम्हीं नाहींसा करून टाकला. असें कां व्हावें? याचे कारण तुमच्या लक्ष्यांत येत नाही काय? या गोष्टी तुम्हांस समजत नाहीत असे नाही. यांतील कार्यकारणभाव तुम्हांस चांगला समजतो. आपलें दौर्बल्य आपणांस जेथें तेथें नडते. तुमचे शरीर अशक्त आणि मनही अशक्त. आत्मश्रद्धा कशी ती तुम्हांस ठाऊकच नाही. गेली कित्येक शतकें चालीरीतींच्या, जातिभेदाच्या, राजांच्या आणि परकीयांच्या अंमलाखाली तुम्ही निःसत्व बनून गेला आहां. माझ्या बंधूंनो, तुमच्याच जातभाईंनी तुमचे सत्वहरण केले आहे. तुमच्या पाठीचा कणा मोडून गेला आहे. पायाखाली सरपटणाऱ्या किड्यांच्या पंक्तीला तुम्ही गेलेले आहा. तुम्हांला सामर्थ्याची देणगी कोण देणार? मी तुम्हांला पुनःपुन्हां हेच सांगतों की बाबांनो, सुदृढ व्हा. आज आपणाला जर कोणत्या वस्तूची जरूर असेल तर ती शक्तीचीच आहे; आणि हे साधण्याकरितां 'अहं ब्रम्हास्मि' या मंत्राचा जप ही पहिली पायरी आहे. उपनिषदांचा अभ्यास करून हेच तत्व प्रथम मुखोद्गत करा. "मला शस्त्र कापू शकत नाही, अग्नि जाळू शकत नाही, वायू शोषू शकत नाही; मी सर्वशक्ति आहे." या मंगलमय मंत्राचा जप नित्य नित्य करीत जा. हाच तुमचा तारक मंत्र आहे. "मी दुर्बल, माझ्याने काय होणार?" अशी अक्षरेंसुद्धा तोंडावाटे कधी काढू नका. 'कर्तुमकर्तुम् अन्यथा कर्तुं' असे माझें सामर्थ्य आहे असे म्हणत जा. आपणाला करण्यास अशक्य असें या जगांत काय आहे? वाटेल ती गोष्ट आपण करूं. आत्मा सर्वशक्तिमान् आहे. पण या गोष्टीचा विसर आपणांस पडला आहे. आतां ही गेलेली श्रद्धा पुन्हां परत आणली पाहिजे. नाचिकेताची कथा ध्यानात आणा. बापाने यज्ञ केला तेव्हां नाचिकेताची श्रद्धा जागृत झाली. याच श्रद्धेची प्राप्ति आपणांपैकी प्रत्येकास प्राप्त झाली तर काय बहार होईल! तुमच्यापैकी प्रत्येक जण उठेल आणि जग हालवून सोडील. तुमचे अनंत परमात्मरूप व्यक्तदशेला येईल. असे व्हावे इतकीच माझी इच्छा आहे. हे सामर्थ्य आणि ही श्रद्धा या वस्तू उपनिषदांपासून तुह्मांस प्राप्त होणाऱ्या आहेत.<br>{{gap}}पण इतके दिवस ही विद्या केवल संन्याशांच्या हाती राहिली होती. हे मोठे रहस्य त्यांनी गुप्त राखिले. हे रहस्य उराशी बाळगून ते अरण्यांत दडी देत.<noinclude></noinclude>
nuoac1581j6yfh7h6ao4krqzex3zehp
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९५
104
66760
233090
152161
2026-07-12T06:48:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233090
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>श्रीशंकराचार्यांनी याहून थोडे अधिक औदार्य दाखविले. उपनिषदांचा अभ्यास गृहस्थांनीही करावा अशी अनुज्ञा त्यांनी दिली. या अभ्यासाने त्यांचे नुकसान न होतां थोडाबहुत फायदा होईल असा आचार्यांचा आशय होता. पण अद्यापिही या बाबींत पुष्कळ गैरसमज पसरला आहे. हे ग्रंथ केवळ अरण्यवासी जनांच्या मात्र उपयोगी आहेत असें पुष्कळांस वाटते. उपनिषग्रंथांचे खरे रहस्य तुम्हांस पाहावयाचे असेल, तर ते एकाच जागी तुम्हांस सांपडेल. वेद निर्माण होण्यास ज्यापासून स्फूर्ति मिळाली त्याच भगवान् श्रीकृष्णाने गीताग्रंथांत या साऱ्या रहस्याचे उद्घाटन स्वतः केलें आहे. श्रुतींवरील उत्तमोत्तम टीका म्हटली म्हणजे. हीच. तुम्ही कोणत्याही धंद्यांत पडलेले असा, अथवा समाजांत तुमची कोणतीही पायरी असो, गीतेच्या द्वारे हे रहस्य तुम्हास हस्तगत करून घेता येईल. अमुक एका व्यक्तीला येथे अधिकार नाहीं असें नाही. वेदान्ताचे हे सिद्धांत आतां व्यवहारांत दिसू लागले पाहिजेत. आतां आपला अरण्यवास संपवून त्यांनी संसारांत आले पाहिजे. गुहा सोडून घरांचा आश्रय त्यांनी आतां केला पाहिजे. जगांतील एखाद्या विशिष्ट परिस्थितीत गुंतून न राहता त्यांनी सर्वत्र पसरले पाहिजे. विद्यार्थ्यांच्या शालागृहांत, कोळ्यांच्या घरांत, गरिबांच्या झोपडयांत, श्रीमंतांच्या राजमहालांत, वकिलांच्या कोठडीत आणि बड्या न्यायाधीश साहेबांच्या अंतर्गृहांत त्यांनी आतां प्रवेश केला पाहिजे. कथापुराणांतूनही त्यांनी शिरले पाहिजे. प्रत्येक पुरुषाला, स्त्रीला आणि मुलालासुद्धा त्यांनी आपापले कर्तव्य शिकविले पाहिजे. कोणी कोणत्याही परिस्थितीत असो, त्याची कर्तव्याची जाणीव त्यांनी त्याला करून दिली पाहिजे.<br>{{gap}}वेदान्ताचा अभ्यास सर्रास सुरू झाला, तर समाजाची घडी बिघडेल अशी धास्ती पुष्कळांस वाटते. पण अशी भीति वाटण्याचे काही कारण नाही. कोणी उपनिषदांचा अभ्यास सुरू केला म्हणून आपल्या कक्षेच्या बाहेर त्याला उडी मारता येते असे नाही. एखाद्या मासेविक्याने वेदान्त वाचला म्हणून आपला धंदा सोडून तो गिरिकंदरांत जाईल ही भीति अस्थानी आहे. धर्मानें अनंत मार्ग दाखविले आहेत. हे सारे रस्ते सोडून त्याहून एखादा वांकडा मार्ग कोणी नवाच काढील, अशी भीति बाळगण्याचे कारण नाही. मार्ग कोणताही असो, त्याचे मनःपूर्वक आचरण तुम्हीं केलें, तर तोच तुम्हांस<noinclude></noinclude>
1dz4n396tefdcatosshclj74d59xpzd
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९६
104
66761
233091
152162
2026-07-12T06:52:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233091
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१९१ }}
{{rule}}</noinclude>कल्याणप्रद होईल. मनापासून केलेले अगदी थोडें धर्माचरणही कितीतरी हितकर होते. 'स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्।' या गीतावचनाचे रहस्य हेच आहे. याकरितां प्रत्येकाने आपल्याकडून होईल तितका या धर्माचा अंश सांठवावा. आपणाकडून महत्कार्य होत नाही ह्मणून हात जोडून स्वस्थ बसू नये. 'शिवोऽहम्' असा जप एखाद्या मासेविक्याने केला तर तो अधिक चांगला मासेविक्या होईल; आणि हाच जप एखाद्या विद्यार्थ्याने केला तर तो अधिक चांगला विद्यार्थी होईल. हाच न्याय सर्वत्र लागू पडतो. कोणी कोणत्याही परिस्थितींतील मनुष्य असला तरी यामुळे त्याची स्थिति न बिघडतां ती अधिक चांगली होईल.<br>{{gap}}आतां अशा रीतीने सर्वच वेदान्ती झाले तर ज्ञातिबंधने तुटून सबगोलंकार होईल, अशी धास्ती कोणास वाटत असेल तर ती अस्थानी आहे. यामुळे जातिभेद नाहींसा न होता तो अधिक बळकट आणि अधिक व्यवस्थित होईल; कारण लहान लहान समाज करून राहावे हा मनुष्याचा स्वभावच आहे. आतां इतकी गोष्ट मात्र खरी की सांप्रत कांहीं जातींना जे विशिष्ट हक्क आहेत ते नष्ट होतील; आणि असे विशिष्ट हक्क नष्ट होण्याने जनसमाजाचें कांहीं नुकसान होणार नाही. जातिभेद स्वभावसिद्ध आहे म्हणूनच 'चातुर्वर्ण्य मया सृष्टं गुणकर्म विभागशः' असें भगवान् श्रीकृष्णांनी म्हटले आहे. जातिभेद समाजाच्या वाढीला पोषक आहे. तो तिचा विघातक नाही. एखादें काम माझ्या हातून चांगले होईल, तर तुमच्या हातून दुसरे एखादें काम चांगले होईल. तुमचे काम माझ्याने चांगले होणार नाही आणि माझें काम तुम्हांस चांगलेंसें साधणार नाही. देशाचा राज्यकारभार शिस्तवार करण्याची विद्या तुम्हांस अवगत असेल; आणि जुन्या जोड्यांना ठिगळं लावण्याची विद्या मला येत असेल. अशा स्थितीत मला राज्याधिकार दिला आणि तुम्हांस जोडे शिवावयास लावले तर ते योग्य होईल काय? मी जोडे शिवीत असलों आणि तुम्ही वेद पढण्यांत हुशार असला तर तेवढ्यामुळे माझ्या मस्तका वर पाय देण्याचा अधिकार तुम्हांस प्राप्त होतो काय? ब्राह्मणाने खून केला तरी तो त्याला माफ आणि शूद्राने एखादी चोरी केली तर त्याला सुळाची शिक्षा हा न्याय कोठला? असले विशिष्ट हक्क नाहीसे होणे हेच आपल्या साऱ्यांच्या हिताचे आहे. जातिभेद नष्ट होणे चांगलें नाहीं; कारण तो स्व-<noinclude></noinclude>
cddjir5hoxzndb60t0frjp6nh5v7b3e
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९७
104
66762
233092
152163
2026-07-12T06:55:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233092
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>भावजन्य आणि समाजाच्या वाढीला पोषक आहे. समाजरचनेतील घोटाळे नाहींसे करून त्याला व्यवस्थित रूप देण्याचे कार्य जातिभेद करतो. समाजाची घटना सुयंत्रित चालण्याचे अगदी स्वभावसिद्ध साधन जातिभेद हेच आहे. याशिवाय इतके सोपें दुसरें साधन आपणास उपलब्ध नाही. काही झालें तरी लहान लहान जमाव करून राहणे ही मनुष्याची उपजत बुद्धि आहे आणि ती नाहीशी करणे तुम्हांस कधीच शक्य नाही. पण असे असले तरी काही जातींस त्यामुळे विशिष्ट हक्क प्राप्त होतात असा अर्थ नाही. असे हक्क प्राप्त होणे ही स्वभावसिद्ध घटना नव्हे; ती कृत्रिम रचना आहे. याकरितां असल्या हक्कांचा कपाळमोक्षच केला पाहिजे. कोळ्याला तुम्ही वेद पढविले तर सर्वांचे मनुष्यत्व एकाच योग्यतेचे आहे ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावांचून राहणार नाही. एक मासेविक्या असला आणि दुसरा मोठा तत्त्ववेत्ता झाला तरी दोघांतील मनुष्यत्वाचा सामान्य धर्म एकच आहे असे तो म्हणूं लागेल. दोघांच्याही ठिकाणी एकाच परमात्म्याचा वास आहे असें तो सांगेल. असे झाले म्हणजे सांप्रतचे विशिष्ट हक्क आपोआपच संपुष्टांत येतील. असे होणे हे आपणांस इष्टच आहे. कारण त्यामुळे सर्वांस सारखीच संधि मिळेल. सर्वांच्या अंतर्यामी एकाच परमेश्वराचा वास आहे ही गोष्ट सर्वांस पटली म्हणजे प्रत्येकजण आपापल्यापरी आपल्या उन्नतीचा मार्ग शोधून काढील.<br>{{gap}}स्वतंत्रतेशिवाय वाढ नाही. पूर्ण स्वातंत्र्यावांचून कोणत्याही वस्तूची वाढ होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक वस्तूची उत्क्रांति अंतरंगांतूनच व्हावयास पाहिजे. कोणी कोणाची वाढ करूं शकत नाही. मी अमक्या एकाची वाढ करीन असें कोणासही म्हणतां यावयाचे नाही. एकाने दिली आणि दुसऱ्याने घेतली अशी ही वस्तूच नव्हे. "आत्मैवह्यात्मनो बंधुः" हा सिद्धांत प्रत्येकानें ध्यानात ठेवला पाहिजे. प्रत्येक स्त्रीची, पुरुषाची आणि मुलाची उन्नति ज्याची त्याजवर अवलंबून आहे. विधवांची स्थिति आणि सामान्यतः स्त्रीवर्गाची उन्नति यांजबद्दल अनेकवार अनेक प्रकारचे प्रश्न लोक मला विचारीत असतात. या बाबतीत माझें मत काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा पुष्कळांस दिसते. याकरितां याचे उत्तर एकदाचे देऊन टाकावें हें बरें. लोकांच्या या प्रश्नावर उत्तरादाखल मी उलट एक प्रश्न असा विचारतों की<noinclude></noinclude>
cuxdixfbwxbtxy9bvh0zbl0qugzgshq
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९८
104
66763
233093
152164
2026-07-12T07:03:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233093
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१९३ }}
{{rule}}</noinclude>मी काय विधवा आहें? मला विधवा समजून असे मूर्खपणाचे प्रश्न तुम्ही मला विचारतां काय? कीं मी स्त्री आहे म्हणून त्यांच्या उन्नतीबद्दल मला विचारतां? हा प्रश्न स्त्रियांचा आहे आणि याचें उत्तर त्याच देतील. आपापल्या अडचणींची वासलात ज्याची त्यानेंच लावली पाहिजे. स्त्रियांच्या बऱ्यावाईटाचा विचार करणारे तुम्ही डुड्ढाचार्य कोण? जगांतील प्रत्येक विधवेवर आणि स्त्रीवर वाटेल ती सत्ता चालविण्यास तुम्ही काय सर्वसत्ताधीश परमेश्वर आहां? हा नाद आतां तुम्ही सोडून द्या इतकेंच मी तुम्हांस सांगतों. आपल्या बऱ्यावाईटाचा मार्ग त्याच शोधून काढतील. अरे जुलमी सुलतानांनो, कोणाचेंही बरें वाईट करणें आपल्या हाती आहे या भ्रमानें तुम्हांस पछाडलें आहे! आतां हा भ्रम तुम्ही प्रथम झुगारून देऊन दूर व्हा पाहूं. स्त्रियांच्या बऱ्यावाइटाची चिंता तुम्हांस नको. त्यांची चिंता करण्यास त्या स्वतःच समर्थ आहेत, आणि सर्वांची चिंता परमेश्वरास आहे. त्याची कृपादृष्टि सर्वांवर सारखीच असते. सर्वांचा मार्गदर्शक तोच आहे. आपण सर्वज्ञ आहों अशी घमेंड बाळगणारे तुम्ही कोण? प्रत्येक जीवात्मा परमात्म्याचा अंश आहे हे तुम्हांस ठाऊक नाहीं काय? ज्या अर्थी परमेश्वराहून आपणांस अधिक सत्ता आहे असें समजण्याचें धाष्टर्य तुमच्या अंगी आहे, त्या अर्थी ईश्वरद्रोही हाच किताब तुम्हांस दिला पाहिजे. तुम्ही आपल्यापुरता विचार करा. स्वतःच्या बऱ्यावाईट कर्मापलीकडे पाहण्याचें कारण तुम्हांस नाहीं. तुमच्या स्वतःच्या कर्तबगारीला पुरून उरेल इतका प्राचीनकर्माचा सांठा तुमच्यापाशी आहे, त्याची वासलात अगोदर लावा. लोकांच्या स्तुतीला भुलून या भलत्याच कंदांत यापुढे पडूं नका. लोकांना काय, अमका मोठा समाज-सुधारक म्हणून त्याला देव्हाऱ्यांत बसवतील, महर्षि म्हणून स्तुतिस्तोत्रांचा वर्षाव त्याजवर करतील, आणि या स्तुतीच्या निनादाने आकाशसुद्धां भरून सोडतील. शेंकडों मूर्ख तुमची आरती करण्यास सिद्ध होतील; पण ध्यानांत ठेवा की तो सर्वसाक्षी क्षणभरही झोंपीं जात नाहीं; आणि आजच्या या स्तुतिस्तोत्रांची सव्याज भरपाई येथे अथवा इतउत्तर केल्यावांचून तो राहणार नाहीं.<br>{{gap}}'जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत' ही आज्ञा सदैव लक्ष्यांत बाळगा. कोणाचे आपण बरें वाईट करू शकूं अथवा कोणाला मदत करूं<noinclude><br>{{gap}}स्वा० वि० सं०-९-१३.</noinclude>
71jo660x4wb4b989xb0znszwl7deny0
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/१९९
104
66764
233094
152166
2026-07-12T07:06:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233094
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>शकूं ही कल्पनाच खोटी आहे. फार झाले तर आपण कोणाची सेवा करूं शकूं. परमेश्वराच्या लेकरांची सेवा तुम्ही करा; अथवा तितका हक्क तुम्हांला प्राप्त झाला असेल तर प्रत्यक्ष परमेश्वराचीच सेवा करा. आपल्या एखाद्या लेंकराच्या उपयोगी तुम्हीं पडावें एवढी कृपा त्याने तुम्हांवर केली असेल, तर तुमचे जीवित सार्थ होय! तुम्ही धन्य आहां, पुण्यवान् अहां असें म्हटले पाहिजे. स्वतःच्या बडेजावकीच्या खोट्या कल्पनांनी व्यर्थ फुगून जाऊं नका. सामान्य माणसांस प्राप्त न होणारा सेवेचा हक्क तुम्हांस मोठ्या भाग्याने प्राप्त झाला आहे. याकरितां या हक्काचा उपयोग करून परमेश्वराचे पूजनही त्याचद्वारे तुम्ही साधाल. वस्तुमात्राच्या ठिकाणी परमात्मरूप मी पाहावें आणि त्याचे पूजन करावें हा मुक्ति मिळविण्याचा सोपा मार्ग होय. जगांतील दरिद्री आणि दुःखी कष्टी लोक आमच्या मुक्तीकरितांच आहेत. भगवंताचे पूजन आम्हांस करता यावे म्हणून तोच रोगग्रस्तांच्या रूपानें, वेड्यापिशांच्या रूपाने, रक्तपित्यांच्या रूपाने आणि भयंकर पातक्यांच्या रूपानेही अवतार घेतो! माझे हे शब्द तुम्हांस धाष्टर्याचे वाटत असतील, पण पुनः पुन्हां मी हेच म्हणतो की, अवघे विश्व परमात्मरूप दिसू लागणे ही आपल्या जीवनसौख्याची परमावधि होय. विश्वांतील या विविधरूपांनी परमेश्वर नटला आहे असें दिसलें म्हणजे दृश्यापलीकडे आपण जातो आणि मग पाहावयाचे असे काही उरतच नाही. दुसऱ्यांवर सत्ता चालवून आणि त्यांना मोठ्या बंदोबस्ताने आपल्या ताब्यात ठेवून त्यांचे कल्याण आपण करूं शकू ही कल्पना तुम्ही प्रथम टाकून द्या. एखाद्या झाडाला वाढीला लावावयाचे असलें तर त्याला खतपाणी घालणे आणि योग्य हवेच्या जागी त्याची योजना करणे इतकेच आपल्या हाती आहे. यांपैकी त्याला जरूर असतील त्या वस्तू घेऊन आणि त्या पचवून ते स्वभावतःच वाढू लागते. त्याची वाढ करणे तुमच्या हाती नसून फक्त अनुकूल परिस्थिति त्याला निर्माण करून देणे एवढेच तुम्ही करू शकता. हाच न्याय माणसांसही लागू आहे.<br>
{{gap}}जेवढा प्रकाश तुमच्याने जगांत आणवेल तेवढा आणा. या प्रकाशाची प्राप्ति प्रत्येकास करून द्या. अशी प्राप्ति प्रत्येकाला होईपर्यंत आपले कर्तव्य संपत नाही. या प्रकाशाची जरूर दरिद्र्याला आहे आणि श्रीमंतालाही आहे. किंबहुना, गरीबापेक्षा श्रीमंतालाच ही गरज अधिक आहे! अज्ञ मनुष्याला<noinclude></noinclude>
9tldm5wuyznhd2j7l2zfjmk7hly6u12
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२००
104
66765
233095
152167
2026-07-12T07:08:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233095
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप.|१९५ }}
{{rule}}</noinclude>ही गरज आहेच, पण सुशिक्षितांना ती त्याच्याहून अधिक आहे! कारण, आमच्या अर्वाचीन शिक्षणपद्धतीने सुशिक्षितांच्या अंगी जी ज्ञानाची सूज येते तिचे स्वरूप फारच भयंकर आहे! आज प्रकाशाची जरूर सर्वत्र भासत आहे. याकरिता ती भागविण्याचा यत्न तुमच्याने होईल तितका करा आणि मग बाकीचे कार्य भगवंताच्या मर्जीवर सोपवा. 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' हे त्याच भगवंतानें तुम्हांस सांगितले आहे. स्वतःसाठी म्हणून कांहीं कर्म आरंभू नका. अथवा अमुक कर्म शेवटास नेऊन त्याचें फळ मी भोगीन हेही म्हणूं नका; तथापि सदोदित कर्मरत मात्र रहा. एक क्षणही रिकामा घालवूं नका.<br>{{gap}}आमच्या पूर्वजांना अत्यंत प्राचीनकाळी हा अमूल्य ज्ञानाचा ठेवा ज्याने दिला तोच भगवान् आपल्या आज्ञांच्या पूर्तीस लागणारे सामर्थ्य तुम्हांस देतो.<br><br><br>
{{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}{{nop}}<noinclude></noinclude>
lax6r2cty8sdjqbv6jbxeya25ez7ase
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०१
104
66766
233097
152169
2026-07-12T07:13:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233097
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|'''हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.'''}}}}
{{rule|7em}}
{{gap}}हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्त्यांविषयी बोलण्याचा विचार मनांत आणतांच ऐतिहासिक काळाच्यामागे कित्येक शतकें माझें मन धाव घेतें. या काळाचा उल्लेख कोणाहि इतिहासकाराने केलेला नाहीं; आणि या काळांतील अंधकारांत दडून राहिलेलें रहस्य बाहेर आणण्याची धडपड दंतकथांनी केली असतां तीहि निष्फळ झाली आहे. हिंदुस्थानांत तत्त्ववेत्ते किती होऊन गेले याची मोजदाद करणे बहुधा दुरापास्त आहे. कारण, गेली हजारों वर्षे तत्त्ववेत्ते निर्माण करण्यावांचून दुसरा कोणता धंदा हिंदु राष्ट्राने केला आहे? याकरितां हिंदी तत्त्ववेत्त्यांसंबंधी चर्चा करितांना त्यांतील काही शेलक्या व्यक्तींचा उल्लेख मात्र मी करणार आहे. तत्त्वमीमांसेच्या बाबतीत जे शब्द कर्त्यांच्या योग्यतेचे झाले, तेवढ्यांबद्दलच थोडीबहुत माहिती मी तुम्हांला सांगेन. आरंभी श्रुतींसंबंधी थोडीशी माहिती करून घेणे आपणांस इष्ट आहे. सत्यवस्तूची चर्चा श्रुतींनी मुख्यतः दोन प्रकारे केली आहे. यांत त्यांच्यापुढे साध्ये अथवा ध्येये दोन प्रकारची आहेत. एक साध्य कालस्थलातीत असून दुसरें कालस्थलाने बद्ध आहे. विशेष परिस्थिति, काल आणि देश एवढ्यापुरतेंच हे साध्य सत्यरूप आहे. हे नितांत सत्य नव्हे. कालस्थलातीत अथवा शुद्ध सत्यवस्तूची चर्चा श्रुति अथवा वेदग्रंथ यांनी केली आहे. यांत जीवात्म्याचे स्वरूप परमात्मरूप, आणि जीवशिवांचा संबंध इत्यादि वस्तूंची चर्चा केली आहे. यानंतर दुय्यम प्रतीचे ग्रंथ म्हणजे स्मृतिग्रंथ होत. मनु याज्ञवल्क्य इत्यादिकांनी हे स्मृतिग्रंथ लिहिले असून दुसऱ्या कित्येकांनी लिहिलेले पुराणतंत्रादि ग्रंथ याच दुय्यम कोटींत येतात. या दुय्यम प्रतीच्या ग्रंथांत सांगितलेल्या प्रमेयांचे मुख्य प्रामाण्य श्रुतिग्रंथांवरच अवलंबून आहे. श्रुति आणि स्मृति यांत विरोध आला असतां श्रुतीच प्रमाण मानली जाते. हा निबंध सर्वव्यापी आहे. यांत कोणालाही ढवळाढवळ करण्याचा अधिकार नाही. मुख्य प्रमाणभूत ग्रंथ शृति आणि त्यानंतर स्मृति, असा क्रम आज दीर्घ कालापासून चालत आला आहे. मनुष्याचें अंतिम ध्येय काय याचा पूर्ण विचार शृतिंनी केला असून त्याची मुख्य बीजे त्यांनीच सांगितली आहेत. अशा प्रका-<noinclude></noinclude>
nwn6movzl0xjujlr2ltn23k7qctaw5g
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०२
104
66767
233098
152170
2026-07-12T07:16:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233098
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|१९७ }}
{{rule}}</noinclude>रच्या पूज्य बुद्धीमुळेच शृतींना हिंदुस्थानांत आदिस्थान मिळाले आहे. स्मृति आणि पुराणे यांनी या बीजांचा विस्तार मात्र केला आहे. विचारपरंपरेचें मूळ शृतीत असून त्याच विचारांचा विस्तार स्मृतिपुराणादिकांत असल्यामुळे त्यांचे प्रामाण्य दुय्यम प्रतीचे ठरलें यांत नवल नाही. सामान्य मार्गदर्शनाचे कार्य शृतींनी उत्तम प्रकारे केले आहे. केवळ दिशा जाणावयाची असेल तर शृतींपलीकडे पहाण्याची गरज नाही. मानवी श्रेष्ठ जीवाचें अंतिम ध्येय काय याचा विचार शृतींपलीकडे करितां येणे शक्य नाहीं; आणि त्यांनी सांगितलेल्या ज्ञानाबाहेर जाणायाचे राहिले असें ज्ञानही नाही. जाणावयाजोगें जितकें कांहीं होते, त्या साऱ्याचे आकलन श्रुतींनी केले आहे; आणि जीवात्म्याला पूर्ण दशा प्राप्त व्हावी ह्मणून आवश्यक असलेले मार्गही श्रुतींनी आधीच सांगून टाकले आहेत. यांतील बारीकसारीक तपशील मात्र त्यांनी सांगितला नाही; आणि तो सांगण्याचे कार्य स्मृतींनी केले. श्रुतींतील एकाच मार्गाचा विस्तार कालस्थलानुरूप स्मृतींनी वेगवेगळ्या प्रकारे केला आहे; तथापि प्रकारांच्या या वेगळेपणामुळे मूळ सत्य वस्तूंत काही फरक झाला आहे असें मात्र नाही. स्मृतिग्रंथांचे कर्ते बहुतेक पुरुष असून काहींचे कर्तृत्व स्त्रियांकडेही आहे. स्मृतींची दृष्टि प्रमेयाच्या परोक्ष स्वरूपाकडे नसून ती त्याच्या प्रत्यक्ष अथवा व्यावहारिक स्वरूपाकडे अधिक असल्यामुळे ती चर्चा व्यक्तींची उदाहरणे देऊन त्यांनी केली आहे. यांत कित्येक व्यक्ति आपणांस अवतारिक स्वरूपाच्या आढळतात. त्यांजकडे पाहून आपले मन थक्क होऊन जाते. त्यांच्या अलौकिकपणामुळे आपलें हृदय दडपून जाते. सारे जग हालवून सोडण्याचे सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे, अशा प्रचंड व्यक्ती आपणांसमोर जणूंकाय प्रत्यक्ष उभ्या राहतात. त्यांच्या पराक्रमांच्या वर्णनानें आपलें चित्त इतकें भारून जातें की, त्यांचा तत्त्वोपदेशहि क्षणमात्र आपल्या चित्तांतून नष्ट होतो. त्यांचा उपदेश विसरून त्यांचे व्यक्तित्व मात्र आपल्या मनांत शिल्लक रहाते.<br>
{{gap}}हिंदु धर्माचा तत्त्वोपदेश करण्याचा मार्ग विशिष्ट स्वरूपाचा आहे. हे स्वरूपहि आपण विशेषेकरून ध्यानात ठेवले पाहिजे. यांत परोक्ष तत्त्वे आणि व्यक्तिविशिष्ट परमात्मरूप अशा दोन प्रकारांचा अन्तर्भाव होतो. परोक्ष तत्त्वांची चर्चा हिंदु धर्मानें जशी मनमुराद केली आहे, त्याचप्रमाणे परमेश्वराच्या मानवी अवतारांची लीलाही त्याने मनसोक्तपणे केली आहे. तथापि<noinclude></noinclude>
dvu28ex3tarc6dyejkdbi02bja3cgr2
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०३
104
66768
233099
152419
2026-07-12T07:18:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233099
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१९८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>या धर्माचा मूळ झरा शृतिग्रंथ हेच होत. शृतिग्रंथांत केवळ परोक्ष तत्त्वांची चर्चा मात्र केली आहे. त्यांत कोणा अवतारांचे वर्णन नाहीं, अथवा त्याने केलेल्या अद्भुत कृत्यांचा मागमूसही तेथे आढळावयाचा नाही. हा सारा उद्योग त्यांनी स्मृतींकडे सोपविला आहे. स्मृति आणि पुराणे यांत परमेश्वराच्या अवताराचे दर्शन आपणांस होते; आणि त्यांतच दुसरेहि अनेक महापुरुष आपणांस आढळतात. येथे आणखीहि एक विशेष मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. हिंदु धर्म कोणाहि व्यक्तीशी बद्ध झालेला नाही. अशा प्रकारें कोणा व्यक्तीशी, अवताराशी अथवा भविष्यवाद्यांशी संलग्न न झालेला असा धर्म फक्त आमचाच आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. जगांतील बाकीच्या साऱ्या धर्माचे अस्तित्व त्याच्या मूळ संस्थापकावर अवलंबून राहिले आहे. ख्रिस्ती धर्माची उभारणी ख्रिस्तचरित्रावर झाली आहे. महंमदी धर्म महंमदाच्या चरित्रावर रचला गेला आहे; आणि अशाच रीतीने बौद्ध आणि जैन धर्म त्या त्या धर्माच्या संस्थापकांवर अवलंबून आहेत. यावरून एक गोष्ट उघड दिसून येण्यासारखी आहे, ती ही की, या धर्मसंस्थापकांच्या चरित्राच्या सत्यतेबद्दल ऐतिहासिक पुराव्याची जरूर उत्पन्न होते; आणि त्याबद्दल त्यानंतर विलक्षण वादविवाद आणि तंटेही उत्पन्न होतात. या महापुरुषांच्या अस्तित्वाबद्दल ऐतिहासिक दृष्ट्या कधींकाळी संशय उत्पन्न झाला अथवा त्याबद्दलचा पुरावा काही कारणाने लंगडा झाला, तर त्यांच्या अनुषंगाने उभी राहिलेली धर्माची इमारतही त्याबरोबरच कोसळण्याचा संभव आहे. असल्या प्रकारच्या आपत्तींतून हिंदु धर्म हजारों वर्षे वांचला याचे कारण हेच की, त्याचे अस्तित्व कोणाही व्यक्तीवर अवलंबून नसून तत्त्वाशीं तें जोडलेले आहे. हिंदु धर्माचे अनुयायी त्याचे सत्यत्व आज कबूल करतात याचे कारण तो अमुक एका व्यक्तीने सांगितला हे नसून त्यांतील तत्त्वें केवलरूप आणि त्रिकालाबाधित आहेत हेच होय. कित्येक व्यक्तींस हिंदू लोक अवतारी पुरुष मानितात; त्यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वर अवतरला असें ते समजतात.<br>{{gap}}तथापि हिंदु धर्माचे अस्तित्व या अवतारी पुरुषांवरही अवलंबून नाही. भगवान् श्रीकृष्ण ही व्यक्ति कितीही मोठी असली तरी शृतिग्रंथावर टीका करण्याचा अधिकार तिला नाही. एवढेच नव्हे तर स्वतः प्रतिपादन केलेल्या मतांस आधार म्हणून शृतिवचनांचा उल्लेख श्रीकृष्णास स्वतः करावा लागतो.<noinclude></noinclude>
9iljpsmajvbva32g502cf961gv751ua
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०४
104
66769
233100
152434
2026-07-12T07:21:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233100
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड ]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|१९९ }}
{{rule}}</noinclude>शृतींचे खरे रहस्य जगाला सांगणारा एक महापुरुष इतकीच भगवान् श्रीकृष्णची ख्याति आहे. हीच गोष्ट इतर अवतारी पुरुषांसही लागू आहे; आणि त्याप्रमाणे शृतींतील ऋषिवर्गासही हाच नियम लागू आहे. मनुष्याला पूर्णत्व येण्यासाठी ज्या ज्या वस्तूंची आवश्यकता आहे, त्या साऱ्यांची तरतूद शृति मातेने आगाऊच करून ठेविली आहे. असे आमचें आदितत्व आहे. वेदांत नाहीं असें नवें तत्त्व एकही आढळावयाचे नाही. सर्व ज्ञानाची परिसीमा ऐक्य हीच आहे. ऐक्याची सिद्धि झाली म्हणजे तेथे ज्ञानाचीही परिसमाप्ति होते. 'सर्वं खल्विदं ब्रह्म' हे सर्व एकरूप आहे, या निश्चयापर्यंत तुम्ही एकवार पोहोंचला म्हणजे त्यापलीकडे जाण्यास तुम्हास अवकाशच उरत नाहीं; आणि अशा अवकाशाच्या अभावी ज्ञानाचीही गरज उरत नाही, हे उघड आहे. या एकरूपतेपर्यंत शृतींनी आधीच मजल मारिली आहे आणि आतां त्यापलीकडे जाणे शक्य नाही. 'तत्वमसि' हा मूल सिद्धांत ज्या दिवशी सिद्ध झाला, त्याच दिवशी सर्व ज्ञान पूर्णदशेस आले; आणि हा सिद्धांतही वेदांतर्गत आहे. आता हे तत्त्व अनुभवास कसे आणावयाचे इतकाच प्रश्न बाकी राहिला. परिस्थित्यनुरूप मार्गदर्शकाची गरज तेवढीच शिल्लक राहिली. बदललेल्या परिस्थितीला अनुरूप अथवा काळाला अनुरूप आणि स्थलाला अनुरूप असा मार्गदर्शक मात्र आपणास हवा. मार्गाची सिद्धि पूर्वीच झाली असून केवळ वाटाड्याचे काम मात्र शिल्लक राहिले आहे. जुन्या मार्गाने लोकांना नेणे इतकेच काम करण्याकरितां अवतारी पुरुषांचा, ऋषिजनांचा आणि संतसत्पुरुषांचा जन्म झाला. भगवान् श्रीकृष्णांनी स्वतःच गीतेंत म्हटले आहेः-<br>{{gap}}"यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदा त्मांनं सृजाम्यहम् ॥ परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥" हिंदुधर्माच्या मूल उत्पत्तीचे स्वरूप अशा प्रकारचे आहे. यावरून काय दिसून येतें? हेच की, एका पक्षी कालस्थलातीत अशा स्वरूपाची तत्त्वें कोणाच्याही मदतीशिवाय आपल्या नियत स्थली उभी आहेत. दुसऱ्या कोणत्याही पायाचा अवलंब त्यांना करावा लागत नाहीं; इतकेच नव्हे तर विवेचक बुद्धीच्या आश्रयाची गरजही त्यांस नाही. मग कोणा मोठ्या ऋषिवर्याचा आश्रय त्यांना नको हे सांगण्याची जरूर नाही. हे<noinclude></noinclude>
8qv4s4nguxyfgvi71mhuwnr83gzk44o
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०५
104
66770
233101
152507
2026-07-12T07:46:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233101
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२०० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>ऋषिवर्य अत्यंत मोठे होते आणि त्यांच्याचप्रमाणे अवतारी पुरुषही अत्यंत उज्ज्वल होते; पण असल्या पुरुषांचीही गरज ही तत्त्वे बाळगीत नाहीत. हिंदुस्थानांतील शृतिप्रणीत धर्माचे स्वातंत्र्य त्रिकालाबाधित कसे आहे, ही गोष्ट तुमच्या लक्ष्यांत आतां आली असेलच; आणि याकरितांच विश्वव्यापी धर्म होण्याची पात्रता कोणत्याहि धर्मात असेल तर ती वेदांत धर्मातच आहे असे आम्ही का म्हणतों हेंहि तुमच्या ध्यानांत आले असेलच. किंबहुना आजच, हा धर्म विश्वव्यापी होऊन राहिला आहे. कारण, तो फक्त तत्त्वांचा द्रष्टा आहे. फक्त तत्त्वे तो शिकवितो आणि कोणाही व्यक्तीचे नांव तो पुढे करीत नाही. ज्या धर्माची उभारणी कोणाही व्यक्तीच्या चरित्रावर झालेली असते, तो धर्म एकाच वेळी साऱ्या जगाला पटेल ही गोष्ट त्रिकालांतही शक्य नाही. केवळ आमच्या एकाच देशाचे उदाहरण घेतले तरी त्यांत किती तरी महापुरुष होऊन गेलेले आहेत. एखाद्या शहरांत पाहिले तर अनेक पुढारी असून त्यांपैकी प्रत्येकाला काही ना काही भक्त असतातच. स्वतःच्या मनाला पटेल त्याच व्यक्तीला पूज्य मानण्याची प्रवृत्ति अनादिकालापासून चालू आहे. अशा स्थितीत एकच महंमद, एकच बुद्ध अथवा एकच ख्रिस्त सर्व मनुष्यांस सारखाच कसा पटेल? जगांतील सारी माणसे कोणाही एकाच व्यक्तीला गुरु स्थानी कसे मानतील. अशा एकाच व्यक्तीने सांगितलेला तेवढाच धर्म खरा, अशी एकच व्यक्ति म्हणेल तेवढीच नीति खरी, अथवा अशी एकच व्यक्ति सांगेल तेवढाच कायतो खरा शास्त्रार्थ असें मानावयास सारे जग कसे तयार होणार? उलट पक्षी वेदान्त धर्म कोणाहि व्यक्तीला पुढे करीत नाही. अमक्या व्यक्तीने सांगितली म्हणून अमुक गोष्ट खरी माना, असा आग्रह तो धरीत नाही.<br>{{gap}}मनुष्याचा मूलस्वभाव हाच त्याचा अखेरचा शास्त्रार्थ आहे. मनुष्याच्या ठिकाणी जी चिर स्वरूपाची चैतन्य शक्ति आहे, तीच वेदान्त धर्माची अखेरची अधिष्ठात्री देवता; तीच त्याची नीति, आणि तिची जागृति तोच त्याचा धर्म मार्ग. मनुष्य स्वभावतःच पूर्ण चैतन्यरूप आहे असें तो म्हणतो. हे पूर्णत्व बाहेरून कोठून प्राप्त करून घ्यावयाचे नसल्यामुळे कोणाचीही मदत त्याला नको असें वेदान्त धर्माचे सांगणे आहे. आतां यांत आणखीही एक मुद्दा आहे. परोक्ष तत्वांचे आकलन पूर्णपणे करण्यास लागणारें बुद्धीचे सामर्थ्य सामान्य<noinclude></noinclude>
cs50af6hvb12duv099l3av2zouqk9gy
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०६
104
66771
233102
152509
2026-07-12T07:49:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233102
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते|२०१ }}
{{rule}}</noinclude>जनापैकी बहुतेकांच्या अंगी नाहीं; आणि यासाठी कोणातरी मार्गदर्शक म्होरक्याची आवश्यकता त्यांना आहे, ही गोष्ट अत्यंत प्राचीन काळीही आमच्या ऋषिवर्गाच्या ध्यानी आली होती. परमेश्वर म्हणून कोणातरी पूज्य व्यक्तीची आवश्यकता सामान्य बुद्धीच्या लोकांस आहे, हे त्यांस कळलें होतें. खुद्द बुद्धानें परमेश्वराचे अस्तित्व मानले नाही. परमेश्वर म्हणून काही विशिष्ट रूपाचे व्यक्तित्व अस्तित्वात नाही असे त्याने ठासून सांगितले. पण त्याच्या मृत्यूनंतर ५० वर्षांच्या अवधींत त्याच्या शिष्यांनीच एक व्यक्तिविशिष्ट परमेश्वर निर्माण केला. बुद्धालाच ते परमेश्वर म्हणूं लागले. यावरून कांहीं गुणविशिष्ट परमेश्वराचे अस्तित्व आवश्यक आहे हे उघड दिसून येते. अशा स्थितीत काहीतरी काल्पनिक गुण एकत्र करून त्यांच्या मुशीतून एकादा काल्पनिक परमेश्वर निर्माण करण्यापेक्षा जगांत जे लोकोत्तर पुरुष झाले, ज्यांनी सामान्य मनुष्यांत प्रत्यक्ष व्यवहार केला आणि ज्यांचे अस्तित्व सामान्य जनांनी नजरेने पाहिले, अशाच व्यक्तीला परमेश्वराच्या ठिकाणी मानणे अधिक युक्त नाहीं काय? काल्पनिक गुणांनी उत्पन्न केलेली परमेश्वराची काल्पनिक स्वरूपे बहुधा नव्याण्णव हिश्यांनी इतक्या गलिच्छ स्वरूपाची असतात की, त्यांचे पूजन करणे ही गोष्ट आपल्या माणुसकीला लांच्छन आणते. आपल्या कल्पनांनी उत्पन्न केलेल्या कितीही उत्कृष्ट परमेश्वराच्या स्वरूपापेक्षा हे अवतारी पुरुष आणि महात्मे आपली पूजा घेण्यास अधिक पात्र होतात. तुमच्या आमच्या कल्पना कितीही विशाल झाल्या तरी त्यांतून निर्माण झालेल्या परमेश्वराच्या स्वरूपापेक्षां भगवान् श्रीकृष्ण कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ आहेत. आपल्या मनांत उत्पन्न झालेल्या पवित्रतम मूर्तीपेक्षा भगवान् बुद्धांची मूर्ति निःसंशय अधिक उच्च आहे; आणि यामुळेच हे पुरुष मानवजातीच्या दृष्टीने आज दीर्घकाळ पूजार्ह होऊन बसले आहेत. परमेश्वराच्या काल्पनिक मूर्तीसही या जिवंत अवतारांनी मागे टाकले आहे. मनुष्याची ही प्रवृत्ति आमच्या ऋषिवर्यांस माहीत असल्यामुळे संतांचे आणि अवतारी पुरुषांचे पूजन करण्याची मुभा सर्व लोकांस त्यांनी देऊन ठेविली होती. फार काय पण भगवान् श्रीकृष्ण याच्याही पुढे जाऊन म्हणतात, "यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूर्जितमेव वा । तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंशसंभवम् ॥" ज्या ठिकाणी कांहीं लोकोत्तर गुण स्पष्टत्वास आला असेल, त्या ठिकाणी परमेश्वर अवतरला<noinclude></noinclude>
dngyq7s5kpq6x5gowjrnv049avyo7ux
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०७
104
66772
233103
152511
2026-07-12T07:51:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233103
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२०२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>आहे असा भगवंताच्या म्हणण्याचा आशय आहे. येथे जगांतील कोणत्याही देशांत उत्पन्न झालेल्या विभूतीची पूजा करण्याची परवानगी भगवान् श्रीकृष्णनी आम्हां हिंदु लोकांस देऊन ठेविली आहे. कोणत्याही देशांत आणि कोणत्याहि काळी उत्पन्न झालेल्या सत्पुरुषाची पूजा करण्यास आमच्या धर्मानें मुभा ठेविली आहे. ख्रिस्ती लोकांच्या चर्चात आणि मुसलमानांच्या मशिदीत जाऊन पूजा करणारे हिंदु लोक आजही पुष्कळांच्या पाहाण्यांत आले असतील; आणि असे असावें हे युक्तही आहे. असें कां असूं नये? आमचा धर्म बोलून चालून जगद्व्यापी आहे, हे मी पूर्वी सांगितलेच आहे. त्याच्या पोटांत सर्वांना वाव आहे. तो कोणालाही बाहेर टाकीत नाही. तुमच्या ध्येयाचा दर्जा कोणताही असला तरी हिंदु धर्मात त्याला स्थळ मिळतें. कोणालाही पोटांत घेण्याइतकें औदार्य त्याच्या ठिकाणी आहे. धर्मविषयक म्हणून ज्या ज्या कल्पना साऱ्या जगांत आज अस्तित्वात आहेत, त्या साऱ्यांचा अंतर्भाव हिंदु धर्मात एका क्षणांत होण्यासारखा आहे; आणि पुढे ज्या कल्पना उदय पावणार आहेत, त्यांचा अंतर्भाव आमच्या धर्मात होईपर्यंत स्वस्थ बसून वाट पाहण्याइतकी शांतीही आमच्या ठिकाणी आहे. वेदांत धर्माचे बाहू इतके विशाल आहेत, की त्यांच्या परिघांतून जगांतील कोणतीही धर्मविषयक कल्पना बाहेर राहूं शकणार नाही.<br>{{gap}}अवतारी पुरुष आणि ऋषिवर्य यांसंबंधी आमची कल्पना अशा प्रकारची आहे. ऋषि हा शब्द वेद ग्रंथांत वारंवार आढळण्यांत येतो; आणि सध्याच्या काळी तर तो अगदी सामान्य होऊन बसला आहे. ऋषि म्हणजे मोठे अधिकारी पुरुष. धर्माच्या आणि तत्त्वज्ञानाच्या बाबतीत त्यांचे बोलणे मोठ्या अधिकाराचे असते, हे आपण नीट लक्षात ठेवले पाहिजे. ऋषि या शब्दाची व्याख्या मंत्रद्रष्टा अशी केलेली आहे. मंत्रद्रष्टा म्हणजे सूक्ष्म विचारांस पाहणारा. अमुक तत्त्व खरें की खोटें हे ठरविण्याची अखेरची कसोटी काय, हा प्रश्न अत्यंत प्राचीन काळींहि वारंवार उद्भवत असे. इंद्रियांची साक्ष नेहमीच खरी असते असे नाही. इंद्रियें ही अखेरची कसोटी म्हणता येणार नाही. सत्यवस्तूपर्यंत इंद्रिये पोहोंचूं शकतच नाहीत. असें 'यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' या शृतीने निदर्शित केले आहे. त्याप्रमाणे 'न तत्र चक्षुर्गच्छति न वागच्छति नो मनः' या शृतींतही याच मुद्याचे स्पष्टीकरण<noinclude></noinclude>
71vpuqbkvk49342zkxifo8rpgmj6g34
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०८
104
66773
233104
152519
2026-07-12T07:55:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233104
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते|२०३ }}
{{rule}}</noinclude>आहे. हे स्पष्टीकरण फार पुरातन काळचे आहे. ही वचनें सांगितल्याला आज युगांची युगे होऊन गेली आहेत. बाह्य सृष्टींत आपण कितीही भटकलों तरी आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल आपली निःसंशय खात्री होण्याचे साधन तेथे आपणांस सांपडणे शक्य नाही. त्याचप्रमाणे परमात्मरूपाचे अस्तित्व, आत्म्याचे अमरत्व, मानवी जीविताचें अंतिम साध्य इत्यादि अनेक प्रश्नांचा समाधानकारक निकाल बाह्य सृष्टींत फिरून कधीहि लागावयाचा नाही. आपले मन प्रत्येक क्षणी बदलत आहे. कढत असलेल्या पाण्याप्रमाणे त्यालाहि एकसारखे कढ येत असतात. ते सान्त आहे. त्याला मर्यादा आहे. त्याला एकतानता नाही. छिन्नविच्छिन्न झालेल्या वस्तूप्रमाणे ते तुकड्यातुकडयांचे बनले आहे. अशा स्थितींत अनंत, अभंग, अच्छेद्य आणि चिरंजीवी अशा वस्तूविषयीं तें आपणांस काय सांगू शकणार? ही गोष्ट त्याला स्वभावतःच अशक्य आहे. या अनेक प्रश्नांची उत्तरें जडसृष्टीपासून मिळविण्याचा यत्न मनुष्याने जेव्हा जेव्हां केला, तेव्हां तेव्हां मोठे अनर्थकारक प्रसंग घडून आल्याची साक्ष इतिहास देत आहे. तर मग शृतींत उपलब्ध असलेल्या ज्ञानाची उत्पत्ति कोठून झाली? ती ऋषींपासून झाली आहे. ऋषि होणे हाच हे ज्ञान मिळविण्याचा मार्ग आहे. हे ज्ञान बाह्य इंद्रियांत नाही. जे इंद्रियगत नाही त्याची साक्ष इंद्रियें कशी देणार? आणि आपण तरी जड इंद्रियांच्या साक्षीवर इतके अवलंबून का राहावें? आपल्या अस्तित्वाचें सारांतलें सार इंद्रियांत सांठवलें आहे काय? 'आहे' असे म्हणण्याची छाती कोणासहि होणार नाही. आपला प्रत्यक्ष अनुभव तरी आपणास काय सांगतो? इंद्रियजन्य सुखें कितीहि भोगली तरी आपल्या जीविताचें अंतिम साध्य तें नाहीं अशी खूणगांठ पटण्याचा एखादा तरी प्रसंग आपणांपकी प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी आलेला असता. आपणांस अत्यंत प्रिय असे एखादें माणूस मृत्युमुखीं जाते, त्याचे शव आपणांपुढे पडलेले असते; अशा प्रसंगी आपल्या चित्ताला मोठा धक्का बसतो. आपल्या साऱ्या चैनींची अखेर हीच काय, असा प्रश्न या वेळी आपल्या चित्तांत उभा रहातो आणि त्याला 'नाही' हेंच निश्चयात्मक उत्तर आपणांस मिळत असते. कित्येक वेळां आपलें चित्त विलक्षण शांति धारण करितें; आणि भक्तिभावाने ते भरून गेलेले असते. अशा प्रसंगी इंद्रियजन्य सुखांचा विचारहि आपणांस भयप्रद वाटतो. अशा प्रसंगी आपल्या<noinclude></noinclude>
8m4s2ot4e8n631oq849ua6fvmkg7zlr
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२०९
104
66774
233105
152522
2026-07-12T07:57:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233105
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२०४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>मनाचे खरे स्वरूप अल्पस्वल्प अंशाने आपल्या प्रत्ययास येत असते; आणि त्यांतून पलीकडचे अनंतरूप अल्पांशाने आपणांस दिसत असते. या ठिकाणी शब्द पोंचूं शकत नाहीं; आणि तेथे मनहि जाऊं शकत नाही. अशा गोष्टी आपल्या सामान्य जीवनक्रमांत पुष्कळ वेळां घडत असतात. हाच अनुभव वारंवार यावा, तो दीर्घकाल रहावा आणि अखेरीस तो पूर्णत्वास पावावा हाच आपला अभ्यास आणि हेच आपले अखेरचे साध्य. जीवात्मा इंद्रियांनी बद्ध नाही, ही गोष्ट फार प्राचीन काळी मनुष्याच्या लक्षात आली. फार काय, पण तो जाणिवेनेंहि बद्ध नाही असे त्यास कळून आले. अनंत शृंखलेत जाणीव हा एक दुवा आहे, ही गोष्ट आपण नीट समजून घेतली पाहिजे. अस्तित्व आणि जाणीव ही एकरूप नाहीत. जाणिव हा अस्तित्वाचा एक भाग मात्र आहे. जाणिवेपलीकडे उडी मारण्याचे धैर्य ज्यांना असते तेच अनंतापर्यंत पोहोंचूं शकतात. जाणीव इंद्रियांनी बद्ध आहे. तिचे वास्तव्य इंद्रियांच्या मर्यादेत आहे. आपणांस इंद्रियांपलीकडे आणि जाणिवेपलिकडे गेले पाहिजे. तसे झाले तरच सत्यवस्तूची भेट आपणांस होईल. इंद्रियांपलीकडे गेलेली माणसे आजमितीस आहेत. यांनाच सत्यवस्तु ठाऊक असते; आणि याच सत्यद्रष्ट्यांना ऋषि असें म्हणतात.<br>{{gap}}आपल्या सामान्य दृष्टीला आजूबाजूच्या वस्तू जशा दिसतात, त्याचप्रमाणे शृतींना सत्यवस्तु दिसली. सामान्य वस्तूंच्या अस्तित्वाबद्दल आपले डोळे जसे प्रमाण आहेत त्याचप्रमाणे सत्यवस्तूविषयीं वेदप्रामाण्य आहे. याला प्रत्यक्ष प्रमाण असें म्हणतात. जी गोष्ट आपण डोळ्यांनी पाहृतों, तिच्या अस्तित्वाबद्दल दुसऱ्या कसल्याहि प्रमाणाची अपेक्षा आपण करीत नाही. त्याचप्रमाणे वेदांनाहि सत्यवस्तु प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध असते. माझ्या समोरील हे मेज मी माझ्या बाह्य इंद्रियांनी पहातों; त्याचप्रमाणे चैतन्य वस्तूचे अस्तित्व जाणिवेपलीकडे गेल्यानंतर मला प्रत्यक्ष दिसू लागेल. अशी स्थिति अमुक एकाला प्राप्त करून घेता येते, अथवा ती अमुक स्थली आणि अमुक काली प्राप्त होते असे नाही. ती प्राप्त करून घेण्याच्या मार्गात जात अथवा वय ही आड येत नाहीत. आर्याला, अनार्याला, म्लेंच्छालाहि आणि दुसऱ्या कोणालाहि हीच स्थिति प्राप्त करून घेता येण्यासारखी आहे, असें वात्स्यायनांनी ठासून सांगितले आहे. वेदांतील ऋषित्व तें हेच; आणि हिंदु धर्माचें<noinclude></noinclude>
k37gqg8dx44s7f7cs913xpms4im3ib5
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१०
104
66775
233106
152525
2026-07-12T08:00:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
233106
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते|२०५ }}
{{rule}}</noinclude>अखेरचे साध्य हेच आहे हे आपण नित्य लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही धर्माचें साध्य हेच असले पाहिजे, ही गोष्ट जगांतील सर्व राष्ट्रांच्या गळी उतरली, तर जगांतील पुष्कळशी तंटेभांडणे नाहीशी होतील. धर्म ही वस्तु काही विशिष्ट ग्रंथांत सांठविलेली आहे असें नाहीं. शुष्क उपपत्तीत ती नाही; ती हठवादांत नाहीं, ती पांडित्यांत नाही, अथवा मोठ्या बुद्धिवादांतहि तिचे अस्तित्व नाही. जी वस्तु तुम्हांस सत्य अशी वाटते ती स्वतः होऊन जाणे यांत धर्म आहे. ऋषित्व अंगी आणून सत्यवस्तूची भेट जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष घ्याल, तेव्हांच तुम्ही धर्ममार्गी आहां असे म्हणता येईल. असे होईपर्यंत धार्मिक जीवनाचा प्रारंभहि तुम्ही केला नाही असे म्हटले पाहिजे. जाणिवेपलीकडे जाईपर्यंत तुमच्या धर्मविषयक कथांना वायफळ बडबडीहून अधिक किंमत नाहीं; फार झाले तर तुम्ही आगाऊ तयारी करीत आहां इतकेंच मानतां येईल. ज्या वस्तूविषयी तुम्ही बोलतां तिचे प्रत्यक्ष ज्ञान तुम्हांस नसून तुमचें तें ज्ञान उष्टें असतें. लोक बोलतात तें ऐकून तुम्हीहि बोलत असतां. एके प्रसंगी कांहीं ब्राह्मणांशी भगवान् बुद्धांचा मोठा वाद झाला. ब्रह्माचे स्वरूप काय हा वादाचा विषय होता. तेव्हां भगवान् बुद्धांनी ब्राह्मणांस प्रश्न केला, 'तुम्हीं ब्रह्म पाहिले आहे काय?' त्यावर 'नाही' असे उत्तर ब्राह्मणांनी दिले. तें ऐकून भगवान् बुद्धदेव म्हणाले 'बरें. तुमच्या वडिलांनी अथवा आजोबांनी तरी ब्रह्म पाहिले होते काय?' 'नाही' असे उत्तर मिळतांच बुद्धदेव पुढे म्हणाले, 'माझ्या मित्रांनो जी वस्तु तुम्हीं अथवा तुमच्या वाडवडिलांनीहि डोळ्यांनी पाहिली नाही, तिजबद्दल वादविवाद कशाचा करितां? असल्या वादविवादांत खऱ्याखोट्याचा निवाडा तरी कोणी करावा?' साऱ्या जग भर आज हाच धुमाकूळ चालू आहे. 'हा आत्मा पुष्कळ भाषणाने प्राप्त होणार नाही, हा उच्चतमबुद्धीने मिळण्याजोगा नाहीं, अथवा शृतीच्या अभ्यासानेंहि हा मिळावयाचा नाही.' हे शृतिवाक्य आपण नित्य लक्षांत बाळगिलें पाहिजे. अनुभवाशिवाय आमचे सारे वादविवाद व्यर्थ आहेत. ज्या परमेश्वराबद्दल तुम्ही इतक्या निकराने बोलत असता त्याचे प्रत्यक्ष दर्शन तुम्ही घेतले आहे काय? जगाला ईश्वरविषयक ज्ञान सांगण्याचा हक्क आपणांस प्राप्त झाला आहे असे तुम्हांस वाटते, पण जोपर्यंत परमेश्वराची प्रत्यक्ष भेट तुम्ही घेतली नाही, तोपर्यंत तुमचें सारें ज्ञान फुकट आहे, आणि तुमची बडबड<noinclude></noinclude>
5qa4unh21dqkl4t2cnjpnpwftotkmnd
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२११
104
66776
233107
152528
2026-07-12T08:00:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233107
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|२०६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>फोल आहे. आपण काय बोलतों हे तुमचें तुम्हांसच समजत नाही. परमे श्वराची भेट तुम्ही घेतली असेल, तर तुम्ही कोणाशीहि वादविवाद करणार नाही. तुमच्या ठिकाणी ज्ञानाचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे ही गोष्ट तुमच्या मुखा वरचें तेजच बोलून दाखवील. उपनिषदांत यासंबंधी एक कथा आहे. एका ब्राह्मणाने आपल्या मुलाला ब्रह्मप्राप्तीसाठी गुरुगृही पाठविले. तेथून मुलगा परत आला, तेव्हां बापाने त्याला प्रश्न केला, 'मुला, तूं काय शिकलास?' उत्तरादाखल मुलाने अनेक शास्त्रांची नांवें बापाला सांगितली. ती ऐकून घेऊन ब्राह्मण म्हणाला, 'तर मग अद्यापि तूं कांहींच शिकला नाहीस. याक रितां गुरुगृहीं तूं परत जा.' त्याप्रमाणे मुलगा परत गेला आणि काही काळ लोटल्यावर तो परत आला; तेव्हां ब्राह्मणानें तोच प्रश्न पुन्हां त्याला केला आणि मुलानेंहि पुन्हां तेंच उत्तर दिले. ब्राह्मण म्हणाला, 'तुझ्या या साऱ्या विद्या व्यर्थ आहेत, तूं पुन्हां परत जा.' बापाच्या आज्ञेप्रमाणे मुलगा पुन्हां गुरुगृही गेला. काही काळ लोटल्यानंतर तो परत बापाकडे आला. त्याला पाहतांच बाप म्हणाला, 'मुला, आज मात्र तुझें तोंड ब्रह्मज्ञाप्रमाणे तेजोमय दिसत आहे.' परमेश्वराशी तुमची प्रत्यक्ष भेट होईल त्या वेळी तुमचा सारा नूर बदलून जाईल, तुमचा आवाज वेगळा होईल, किंबहुना तुम्ही सारेच बद लून जाल. अशा स्थितीत तुमचे अस्तित्व मानवजातीला आशीर्वादरूप होईल. तुमच्यापुढे सारे जग नम्र होईल. ऋषित्वाला उल्लंघन करण्याचे सामर्थ्य या विश्वांत कोणालाहि नाही. या स्थितीला ऋषित्व असें म्हणतात, आणि आमच्या धर्माचे अखेरचें साध्य म्हणजे हे ऋषित्व अथवा ही ब्राह्मी स्थिति प्राप्त करून घेणे हेच आहे. याखेरीज बाकीच्या साऱ्या गोष्टी केवळ दुय्यम प्रतीच्या असून त्यांचे महत्व पूर्वतयारीहून अधिक नाही. तात्त्विक वाद विवाद, अनेक दर्शनें, द्वैत, अद्वैत आणि फार काय पण प्रत्यक्ष शृतीचा अभ्यासहि याच दुय्यम स्वरूपाचा आहे. ब्राह्मी स्थिति प्राप्त करून घेणे हा मूलहेतु असून बाकीच्या साऱ्या गोष्टी या मुख्य हेतूची पोषक उपकरणे मात्र होत. ज्या ज्ञानाने ही ब्राह्मी स्थिति प्राप्त होते, तें ज्ञान प्रमुख असून बाकीचें सारे शास्त्रज्ञान दुय्यम प्रतीचे आहे. असे ज्ञान प्राप्त करून घेऊन जे ब्राह्मी स्थितीला पावले, त्यांनाच शृतींत ऋषि अशी संज्ञा प्राप्त झाली; आणि अशा प्रकारची स्थिति प्राप्त करून घेणे, हे आम्हांपैकी प्रत्येक खऱ्या हिंदूचे अवश्य<noinclude></noinclude>
kupayv2cms4vs0sffev1hv4eksojuxb
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१२
104
66777
233108
152531
2026-07-12T08:00:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233108
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते|२०७ }}
{{rule}}</noinclude>कर्तव्य आहे. याच स्थितीला मुक्ति असें नांव आमच्या शास्त्रांनी दिले आहे. अमुक ग्रंथावर अथवा वचनावर माझा विश्वास आहे असे म्हटल्याने ही स्थिति प्राप्त होत नाही; त्याचप्रमाणे हजारों यात्रा करून आणि हजारों देवतांची दर्शने करूनहि ही स्थिति प्राप्त होणार नाही. जगांतील सा-या नद्यांत कितीहि बुचकळ्या तुम्ही मारल्या, तरी तुम्हांस मुक्तिलाभ व्हावयाचा नाही. हा लाभ तुम्हांस करून घ्यावयाचा असेल तर तुम्ही मंत्रद्रष्टा बनले पाहिजे. <br>
{{gap}}शृतिकाल सोडून आपण जरा अलीकडे आलों म्हणजे अवतारी पुरुषांचें दर्शन आपणांस होतें. सारे जग हालविण्यासारखें सामर्थ्य यांच्या अंगीं होतें. असे अवतारी पुरुष अनेक होऊन गेले असें भागवतांत सांगितले आहे. तथापि या अनेक पुरुषांपैकी राम आणि कृष्ण या दोहोंचेंच पूजन हिंदुस्था नांत होते. सत्य आणि नीति यांचा मूर्तिमंत पुतळा राम हा होता. पुत्र, भर्ता, भ्राता, राजा इत्यादि अनेक नात्यांनी रामाचे स्वरूप आदर्शवत् आहे. या रामावताराचें चरित्र महाकवि आणि मोठे ऋषिवर्य श्रीवाल्मीकि यांनी गाइलें आहे. यांच्या वाणीइतकी सुंदर, पवित्र आणि साधी वाणी दुसऱ्या कोठेहि आढळावयाची नाही. यांनी रामचरित्राबरोबरच सीतेचें चरित्रहि सां गितले आहे. हे चित्र या महाकवीने इतक्या बहारीच्या रंगांत रंगविलें आहे की, साऱ्या जगाचा काव्येतिहास तुम्ही पालथा घातला, तरी त्यांत दुसरी सीता तुम्हांस आढळावयाची नाही. सीता ही साऱ्या जगांत एकच. सीतेला तुलना सीतेचीच. ज्या काळी हे चरित्र घडून आले, त्यानंतर आजपर्यंत दुसरी सीता पुन्हां निर्माण झाली नाही. जे चरित्र एकदां रेखाटले गेलें तें आज- पर्यंत अखेरचेच राहिले आहे. कदाचित् राम आजपर्यंत पुष्कळ होऊन गेले असतील, पण सीता मात्र एकटीच. सीता ही हिंदु स्त्रियांचा आदर्श आहे. स्त्री कशी असावी, या प्रश्नाचे उत्तर 'सीतेसारखी' या एकाच शब्दांत भरतभूमीनें कायमचे देऊन ठेविलें आहे; आणि आज हजारों वर्षे हा आदर्श आम्हांपुढे अबाधित राहिला असून अखिल आर्यावर्तातील कोट्यवधि स्त्रीपुरुषांचे आणि मुलांचे प्रणाम तो घेत आहे. प्रत्यक्ष पावित्र्याहून पवित्र असा हा आदर्श काळाच्या अंतापर्यंत असाच कायम रहावयाचा आहे. सान्या आयुष्यभर सीतेने दुःख मात्र भोगिलें, पण त्याविरुद्ध कधी चकारशब्दहि मुखावाटे का ढला नाही. अशी ही पावित्र्याची मूर्ति सर्व जनतेची पूज्य देवी होऊन<noinclude></noinclude>
lxwwelq2mga4gjwli5mhvi22gjsbz5r
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१३
104
66778
233109
152535
2026-07-12T08:00:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233109
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|२०८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}}
{{rule}}</noinclude>बसली आहे. मनुष्यांनीच काय, पण देवदेवतांनीही तिचे पूजन करावे, अशी तिची योग्यता आहे. अशी स्त्री साऱ्या आर्यावर्ताचें आधिदैवत होऊन बसली यांत नवल काय? सीतेचे चरित्र हिंदुस्थानांतील आबालवृद्धांच्या मुखी असते. सर्व पुराणे उद्या काळाच्या पोटांत गेली, शृती लोपल्या, संस्कृत भाषाहि नष्ट झाली, आणि पांच हिंदु शिल्लक राहिले तथापि त्यांच्या मुखांतून सीतेचे चरित्र ऐकावयास मिळेल. सीता सा-या आर्यवंशाच्या रोम रोमांत भिनून राहिली आहे, हे माझे शब्द तुम्हीं पक्के ध्यानात ठेवा. आमच्या स्त्रियांना सुधारण्याचा आणि त्यांना अर्वाचीन बनविण्याचा यत्न तुम्हीं कि तीहि केला, तरी सीतेचा आदर्श सोडून त्यापलीकडे एक पाऊलही त्या सर कावयाच्या नाहीत. तुमचा उद्योग या दृष्टीने सुरू आहे अशी नुसती शंका त्यांना आली, तरी त्याक्षणीच तुमचे सारे यत्न ढांसळून पडतील. हा अनुभव आजपर्यंत शेकडों वेळां आम्हांस प्रत्यक्ष आला आहे. सीतेच्या पावलांमागें पावले टाकूनच आपला मार्ग हिंदु स्त्रीजाती आक्रमील; आणि असे होणे हे योग्यहि आहे. <br>
{{gap}}यानंतर हिंदुस्थानांत आबाल वृद्धांस पूजनीय असा दुसरा अवतार झाला. अनेक रूपांनी या अवताराचे पूजन स्त्रिया आणि पुरुष करीत असतात. या दोघांनाहि तो सारखाच पूज्य आहे. तो बालकांचा जसा आवडता तसाच वृद्धां- नाही तो प्रिय आहे. याच्या संबंधी बोलतांना या अवतारांत परमेश्वर पूर्ण त्वाने अवतरला असे उद्गार भगवान् व्यासांनी काढिले आहेत. त्यांच्या दृष्टीने इतर अवतार परमेश्वराचे केवळ अंशरूप असून श्रीकृष्ण मात्र पूर्णा वतार होत. भगवान् श्रीकृष्णाच्या चरित्राचा विचार केला म्हणजे या व्या सोक्तीबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भगवान् श्रीकृष्ण संन्याशांत संन्यासी होते आणि त्याबरोबरच गृहस्थाश्रम्यांत गृहस्थाश्रमी होते. त्यांचा संन्यास जसा पूर्ण, तसाच गृहस्थाश्रमहि पूर्णत्वास पावलेला होता. त्यांच्या अंगी अतुल शक्ति होती; तथापि ह्या स्थितीतहि ते पूर्ण विरागी होते. गीताशास्त्र उत्तम समजल्याशिवाय भगवान् श्रीकृष्ण यांच्या चारित्र्याचे रहस्य तुमच्या ध्यानी यावयाचे नाही. गीतेंत त्यांनी स्वतःच जी तत्त्वे सांगितली, त्यांचे मूर्तिमंत रूप त्यांच्याच ठिकाणी व्यक्तदशेला आले होते. सारे अव तारी पुरुष अशाच स्वरूपाचे होते. जे तत्त्व तोंडाने उच्चारावयाचें तेंच<noinclude></noinclude>
lzn67rs4v1vggmzgjpmc0xabwos8tgi
पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१४
104
66779
233110
154834
2026-07-12T08:00:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
233110
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते|२०९ }}
{{rule}}</noinclude>प्रत्यक्ष कृतींतहि ते दाखवीत. भगवान् श्रीकृष्णाचें सारें चरित्र गीताशास्त्राला पूर्णपणे धरून आहे. सर्व कर्म करावयाचें परंतु त्यांत कोठेहि गुंतावयाचे नाही, या त्यांच्या उपदेशाचे जीवंत स्पष्टीकरण त्यांच्या साऱ्या चरित्रभर आढळून येते. त्यांनी सिंहासनाचा त्याग केला. आपणांस कधी काळी सिंहा सन होते, याची आठवणहि त्यांस पुन्हां झाली नाही. ज्यांच्या दृष्टिपा ताने संबंध राज्ये उलथींपालथी झाली, त्यांनी स्वतः राजा होण्याची अपेक्षा धरिली नाही. लहानपणी गोपीबरोबर खेळणारा कृष्ण अखेरपर्यंत तसाच साधा भोळा कृष्ण राहिला. गोपींची क्रीडा हा श्रीकृष्णांच्या आयुष्या तील एक लोकोत्तर भाग आहे. या चरित्राचा हा भाग आपणांसारख्या सामान्य जनांस समजणे शक्य नाहीं; आणि स्वतः पूर्ण पवित्र बनेपर्यंत तो समजण्याची आशाहि कोणी धरूं नये. अत्यंत पवित्र अशा प्रेमाचें हैं स्वरूप येथे अत्यंत विशाल झाले आहे. वृंदावनांतील गोपीक्रीडेचे रहस्य कोणालाहि समजावयाचें नाही. भगवान् श्रीकृष्णाच्या भक्तिरसाचें आकंठ पान करून जो झिंगला असेल त्यालाच हे रहस्य समजेल. गोपींच्या शुद्ध आणि निर्व्याज प्रेमाच्या वाहणाऱ्या झऱ्याचे आकलन कोणास कर वेल! ज्या प्रेमांत स्वर्गाची अपेक्षा नाही, ज्या प्रेमांत मृत्युलोकाच्या अस्तित्वाचाहि विसर पडला आणि ज्या प्रेमांत मुक्तीचीही अपेक्षा शिल्लक राहिलेली नाही त्याचे रहस्य कोणी जाणावें? व्यक्त परमेश्वर आणि त्याचेच अव्यक्त रूप या दोन मतांतील तंट्याचा निकाल येथेच लागलेला आहे हे अवश्य ध्यानात ठेवा. मानवी जीविताचे अत्युच्च शिखर म्हणजे व्यक्त परमे श्वर असून अव्यक्त रूप हे फक्त तत्त्वदृष्ट्या जाणावयाचे आहे. अव्यक्त रूप सर्व विश्वभर पसरले असून हे सारे वस्तुजात त्याचेच स्पष्ट रूप आहे. केवळ शास्त्रदृष्ट्या हे म्हणणे आपणांस पटले असले, तरी आपल्या मनोमूमिकेला कोणत्या ना कोणत्या व्यक्त स्वरूपाची आवश्यकता भासत असते. जे आ पल्या डोळ्यांनी पाहतां येईल, ज्याचे ग्रहण सर्व इंद्रियांनी करितां येईल आणि ज्याच्या पायांपाशी आमचे सर्व अंतर्गत आम्हांस खुलें करितां येईल, असें स्वरूप आम्हांस हवे. अशा दृष्टीनेच एखाद्या विशिष्ट रूपाची योजना आम्ही माणसें करीत असतो. याचा अर्थ हाच की, व्यक्त परमेश्वर म्हणजे मानवी मनाची अत्युच्च कोटीची कल्पना तथापि शुद्ध बुद्धीने येथपर्यंत मजल
स्वा० वि० ख०-९-१४<noinclude></noinclude>
f0l0uwg70fwmh56h4wkjsozzzog9otg
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५७
104
110939
233069
2026-07-11T12:03:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233069
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१२५ }}</noinclude>{{gap}}म्यूर कॉलेज व मॅकडोनल्ड हॉस्टेल या भव्य इमारतींच्या पूर्वेस मागच्या अंगास संयुक्तप्रांतामधल्या प्रख्यात पायोनीअर प्रेसची पांढरी शुभ्र इमारत आहे व त्याचे जरा दक्षिणेस प्रख्यात नेहरू पितापुत्रांचा '''आनंद-भवन''' नांवाचा सुंदर राजवाड्यासारख्या वाडा आहे. हाच त्या पितापुत्रांनी काँग्रेसकरितां दिलेला वाडा होय. युनिव्हर्सिटीच्या उत्तर अंगास अलाहाबाद जिल्ह्याच्या पुष्कळ सरकारी इमारती आहेत. हा कट्रा विभाग एकंदरीत बराच स्वच्छ व नव्या सुंदर इमारतींनीं सुशोभित झालेला आहे खरा. हा टाकून कट्रा रोडनें उत्तरेकडे गेलें म्हणजे जिकडे तिकडे खुलीं मैदानेंच मैदाने लागतात. हाच जुना कँटोनमेंट भाग. इकडेच शर्यतीचें मोठें वीस्तीर्ण मैदान आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसांत हा भाग कांहींसा रुक्ष व निर्जन वाटतो. या रस्त्याने थेट उत्तरेस गेल्यावर आम्हाला गंगेवरील '''कर्झनब्रिज''' नांवाचा प्रचंड पूल लागला. हा पूल दुमजली आहे. पण या पुलाच्या पहिल्या मजल्यावरून आगगाडी गेली आहे तर दुसऱ्या मजल्यावरून मोटार रस्ता गेला आहे. या पुलावरून जातांना गंगानदीच्या रुंदच रुंद व पांढुरक्या रेताड पात्राचें व संथपणें वाहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र प्रवाहाचें मोठें आश्चर्य वाटलें. नदीच्या पलीकडच्या तीराला जमीन धुपून जाऊं नये व रेल्वे रस्त्याला धोका येऊं नये म्हणून लांबच लांब दगडाचा गडग्यावजा मोठा बंधारा घातलेला आहे. पुलाचेपलीकडे रेल्वे रस्ता टाकून सडकेनें पुढे गेलें म्हणजे जिकडे तिकडे पांढरासपाट अफाट भूमिभाग क्षितिजापर्यंत दिसतो, व हिमालयाचे पायथ्याशी असलेल्या गंगायमुनाकाठच्या सपाट, सुपीक, पांढरट मातीच्या एकजात प्रदेशाची विस्तीर्णता पाहून मन आश्चर्याने थक्क होऊन जातें. या विस्तीर्ण सपाट भूमिभागांत आम्ही क्षणभर थांबलों व मग बिऱ्हाडीं परत आलों.<br>{{gap}}त्या सायंकाळी आम्हीं अलाहाबादमधील इतिहासप्रसिद्ध '''खसरू''' बाग व म्युनिसिपालिटीच्या पाणीपुरवठ्याचा कारखाना पाहिला.<noinclude></noinclude>
qxmy7jweroltqqq434lcx5rfkvnras8
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५८
104
110940
233070
2026-07-11T12:10:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233070
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>आम्ही बॅलीरोडवरील प्रो. रानड्यांच्या बंगल्याहून कट्रा रोडनें विश्वविद्यालयाचे विस्तीर्ण आवार टाकून थॉर्नहिल रस्ता ओलांडून दक्षिणेकडे जाणाऱ्या '''सिटीरोड''' नांवाच्या रस्त्याने जरा सावकाश गेलो. '''सिटीरोड व थॉर्नहिल रोड''' यांच्या तिठ्यावर सेंट जोसेफ नांवाची मिशनरी लोकांच्या मुलामुलींचीं मोठी हायस्कुले उजव्या हाताला लागली. तर डाव्या हाताला सारखी आल्फ्रेड पार्क लागली. या पार्कमध्यें मेयो मेमोरियल हॉल नांवाचा उंच मनोऱ्यानें मंडित असा मोठा हॉल आहे. तसेंच एका वर्तुळाकार रस्त्यानें मंडित अशा हरळीनें हिरव्यागार दिसणाऱ्या वर्तुळाकार जागेत राणीचा संगमरवरी पुतळा बसविलेला आहे.<br>{{gap}}माझ्या यावेळच्या उत्तर हिंदुस्थानांतील दहाबारा लहानमोठ्या शहरांच्या दृश्यदर्शनामध्ये एक विशेष गोष्ट माझ्या प्रामुख्यानें लक्षांत आली ती ही की, राणीच्या कोणत्यातरी जुबिलीच्या प्रसंगानें या प्रत्येक शहरांत राणीचा संगमरवरी पुतळा बैठा किंवा उभा केलेला असून राणीचें त्या त्या शहरांतील स्मारक मोठें मनोवेधक केलेले आहे. अशा प्रकारची सार्वत्रिक स्थिति मला हिंदुस्थानच्या दुसऱ्या कोणत्याही भागांत आढळून आली नाहीं. अलाहाबादेतील राणीचें स्मारक फार प्रेक्षणीय आहे यांत शंका नाहीं. सभोवारच्या विस्तृत पार्कनें या स्मारकाची शोभा द्विगुणित झाली आहे.<br>{{gap}}सिटीरोड हxxxलवे रस्त्याला ओलांडून जात नाहीं. तर रेलवे रस्त्याखालून सिटीरोड जातो व रेलवे रस्त्याचें उंचच उंच व पूर्व- पश्चिम पसरलेलें एंबॅकमेंट मोठे मजेशीर दिसतें. या रेलवे रस्त्याच्या उंच एंबॅकमेंटने जणूं कांहीं जुनें शहर व नवें शहर यामध्यें मोठा तट घातला आहे असा या रस्त्याने जातांना भास होतो. हा सिटी-रोड जुन्या शहराच्या मधोमध असलेल्या ग्रँड ट्रंक रोड नांवाच्या पूर्वपश्चिम दिशेने जाणाऱ्या रस्त्याला मिळतो. या रस्त्यानें<noinclude></noinclude>
bm2c63e27nadxbv0zwyephexmy5mybx
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५९
104
110941
233071
2026-07-11T12:15:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233071
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१२७ }}</noinclude>जरा पश्चिमेकडे गेल्यावर डाव्या हातास खुसरू बागेची उंच भिंत लागली व मग थोड्या वेळांत या बागेचा किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखा भव्य दरवाजा लागला. या दरवाज्याने आम्हीं मोटार आंत नेऊ शकलो. कारण प्रो. रानडे यांचा एक विद्यार्थी आम्हांला वाटेंत भेटला व तो आमचेबरोबर आल्यामुळे व त्याचा एक नातेवाईक पाणीपुरवठ्याच्या खात्यांत नोकर असल्यामुळे आम्हांला आंत जाण्यास व पाण्याची सर्व व्यवस्था बारकाईनें व स्वस्थपणे पाहण्यास सांपडली. यमुना नदीमधून या बागेत पाणी पंपाने खेचून आणून बागेत एका मोठ्या तलावामध्ये साठविलें आहे. मग त्यांतून पाण्याचा प्रवाह दुसऱ्या तलावांत घेतला आहे व तो घेतांना त्यांत तुरटीचें पाणी मिसळण्याची सोय केलेली आहे. हे पाणी मग निरनिराळ्या हौदांत साठवून तेथें अधिक शुद्ध करण्याची तजवीज केली आहे; शेवटीं पूर्ण शुद्ध झालेले पाणी एका मोठ्या हौदामध्यें घेऊन तेथून पुन्हा तें पंपाने एका उंच टाकीमध्ये चढविलें आहे व तेथून मग सर्व शहराला तोट्यांनी पाणी पुरविले आहे. पूर्वी पंप चालविण्याकरितां स्टीम एंजिन व त्याला अनुरूप अशी यंत्रसामुग्री ही एका मोठ्या इमारतीमध्ये ठेवलेली होती; पण आतां त्या इमारती ओसाड दिसल्या. कारण शहराला विजेचा पुरवठा आल्यापासून पाणी आणणें व शुद्ध करून पुन्हां उंच टाकीमध्ये साठविणे इत्यादि सर्व कामें विजेच्या शक्तीनें चालविली जात असल्यामुळे वाफेच्या यंत्राचा उपयोग नाहींसा झाला आहे. येथली पाणी शुद्ध करण्याची व शहराच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था थेट बंगलोर शहरांतल्या व्यवस्थेप्रमाणे चांगली आरोग्यशास्त्रीय पद्धतीवर केलेली आहे असें मला दिसून आलें. खुसरूबाग बरीच प्रशस्त असून त्याची मांडणी व रचना मनोवेधक आहे. नानारंगी, सदापानी व सदाफुली छोट्यामोठ्या वृक्षवेलींच्या राई व ताटवे केलेले असून मधून फिरण्यास सुंदर फरसबंदी पायवाटा ठेवलेल्या दिसल्या. बागेच्या मधोमध तीन एकसारख्या<noinclude></noinclude>
24wak7zt734plq4gpoygvngj82vq61a
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६०
104
110942
233072
2026-07-11T12:21:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233072
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>कबरी आहेत. त्यांचे दगडी बांधकाम व नक्षीकाम नयनमनोहर आहे यांत शंका नाहीं.<br>{{gap}}ही खुसरूबाग जहांगिर बादशाहाचा थोरला मुलगा व अकबराचा आवडता नातू '''खुसरू''' याच्या नांवानें व याच्या स्मारकार्थ बांधली गेली. जहांगिराची पहिली राणी शाह बेगम ही जयपुरचा राजसिंह याची नात व भगवानदास याची मुलगी होती. जहांगिराचें व हिचें लग्न सन १५८४ मध्ये झालें. तिला सन १५८७ मध्ये खुसरू हा मुलगा झाला. अकबराच्या मृत्यूनंतर यानें बापाविरुद्ध बंड करून गादी बळकावण्याचा प्रयत्न केला; पण तो पूर्णपणे फसला व खुसरूला मरेपर्यंत सक्त कैदेत व पाहऱ्यात ठेवण्यांत आलें. बापलेकांच्या या अमानुष भांडणाचा वीट येऊन शहा बेगमनें अफू खाऊन आत्महत्त्या करून घेतली. या बागेंतील तीन कबरी या त्या मातापुत्रांच्या व कुटुंबांतील इतर मुलामुलींच्या आहेत; अगदीं पूर्वेकडील कबर खुसरूची आहे, मधली शहा बेगमची आहे व तिसरी त्या कुटुंबांतील इतर मुलामुलींची आहे. तिसऱ्या कबरीमध्ये एक शिलालेख आहे. त्यामध्यें बेगमच्या मृत्यूचा सन १६०३ असा दिला आहे. व शिलालेख खोदणाराचें नांव घातलेलें आहे.<br>{{gap}}अशी ही इतिहास प्रसिद्ध बाग पाहून झाल्यावर मोठ्या प्रमुदित मनानें आम्ही घरी परत येतांना नव्या कँटोनमेंटच्या भागाचें ओझरतें दर्शन घेतलें. काय ते प्रशस्त, निर्धूळ, गर्दछाय सुंदर रस्ते, केवढे मोठमोठे सरकारी व खासगी बंगले, त्या बंगल्यासभोंवार कितीतरी खुली जागा व त्यांत नानारंगी फुलझाडें व पानझाडें! या भागांतून मोटारीनें कां होईना पण सावकाशपणें जातांना कँटोनमेंटची हवाशीर, आरोग्यकारक व नयनमनोहर रचना पाहून अर्वाचीन अलाहाबाद शहराचें मोठें कौतुक वाटलें. याच भागांत असलेल्या सर तेजबहादूर सप्रूंच्या पांढऱ्या शुभ्र प्रशस्त बंगल्यावरून आम्ही गेलों. महाराष्ट्रामध्यें नव्हे सर्व हिंदुस्थानामध्यें सर्वतों-<noinclude></noinclude>
stx1bs9lm8uccu1626w2k8l9z91t290
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६३
104
110943
233073
2026-07-11T12:25:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
233073
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||प्रयाग अथवा अलाहाबाद|१२९ }}</noinclude>मुखी झालेल्या सप्रू, नेहरू या प्रख्यात पुढाऱ्यांचीं अलाहाबाद शहरातील प्रख्यात वसतिस्थानें दुरून व ओझरतीं कां होईना पाहून मला फार आनंद वाटला व या दोन पुढाऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सार्वजनिक कामगिरीचें स्मरण होऊन मनाला आश्चर्य व आनंद वाटला. याप्रमाणें कँटोनमेंट ओझरतें दर्शन घेऊन आम्हीं पूर्व पश्चिम जाणाऱ्या लांबच लांब '''म्यूररोडने''' व त्याला जोडणाऱ्या व थेट उत्तर दिशेकडे गंगेपर्यंत जाणाऱ्या सुंदर रस्त्यानें बिऱ्हाडी परत आलों.<br>{{gap}}दुसरे दिवशीं सकाळीं आम्हीं अलाहाबादेतील अर्वाचीन काळचा इतिहास प्रसिद्ध किल्ला व त्या किल्ल्याच्या आवारांत असलेलीं पुरातन काळची प्रेक्षणीय स्थळे व प्रेक्षणीय वस्तू पहाण्यास गेलों व परत येतांना बंडानंतर बांधण्यांत आलेली दक्षिणवाहिनीगंगाकाठची दारागंज पेठ पाहिली.<br>{{gap}}अलाहाबादचा किल्ला हा अकबर बादशाहाचे काळचा किल्ला होय; पण त्यांमध्ये पुढील काळांत इतक्या पुस्त्या व दुरुस्त्या, इतक्या पाडापाडी व इतके फेरबदल झाले आहेत कीं हा किल्ला म्हणजे सध्यां नव्याजुन्याची एक नुसती खिचडी झाली आहे. शिवाय पुरातन काळापासून प्रख्यात व पवित्र असलेल्या वस्तू येथें असल्यामुळे हा अलाहाबादचा किल्ला म्हणजे एक नव्या जुन्या गोष्टींचें सर्वसंग्रहालय बनले आहे.<br>{{gap}}अलाहाबादचा किल्ला अकबर बादशहाने थेट गंगा-यमुनेच्या संगमावर सन १५८४ मध्ये बांधला. हा किल्ला साधारणतः त्रिकोणाकृती आहे. याचा दक्षिणेकडचा तट थेट यमुना प्रवाहाला लागून बांधलेला आहे. म्हणजे हा किल्ला ताजमहालाप्रमाणे यमुना तटाकावर बांधल्या सारखा आहे. या किल्याची पूर्वेकडची भिंत हल्ली तरी गंगा प्रवाहाच्या नजीकच्या मऊ वाळवंटाला खेटून गेली आहे. पूर्व काळीं गंगा नदीचा प्रवाह जरा अलीकडे व पूर्व भिंतीला लागूनच असला पाहिजे. पण किल्ल्याच्या भिंती बांधल्यापासून त्या भिंतीच्या आधारें वाळू साचत<noinclude></noinclude>
0y88zyqqxa4lv1xm92aiy3ph123gj3r