विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.11 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:गोमंतक परिचय.pdf/1 104 57615 233168 102007 2026-07-15T10:03:08Z Milind Mhamal 6092 /* मुद्रितशोधन */ 233168 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="Milind Mhamal" /></noinclude>गोमंतक परिचय TTYS (१ ३३१९ St लेखक प्रो. बाळकृष्ण वामन सांवर्डेकर.<noinclude></noinclude> 9imru653pm1trn4svn9c2e4sshd2hir पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२११ 104 66776 233164 233107 2026-07-15T06:47:13Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233164 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२०६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>फोल आहे. आपण काय बोलतों हे तुमचें तुम्हांसच समजत नाही. परमेश्वराची भेट तुम्ही घेतली असेल, तर तुम्ही कोणाशीहि वादविवाद करणार नाही. तुमच्या ठिकाणी ज्ञानाचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे ही गोष्ट तुमच्या मुखावरचें तेजच बोलून दाखवील. उपनिषदांत यासंबंधी एक कथा आहे. एका ब्राह्मणाने आपल्या मुलाला ब्रह्मप्राप्तीसाठी गुरुगृही पाठविले. तेथून मुलगा परत आला, तेव्हां बापाने त्याला प्रश्न केला, 'मुला, तूं काय शिकलास?' उत्तरादाखल मुलाने अनेक शास्त्रांची नांवें बापाला सांगितली. ती ऐकून घेऊन ब्राह्मण म्हणाला, 'तर मग अद्यापि तूं कांहींच शिकला नाहीस. याकरितां गुरुगृहीं तूं परत जा.' त्याप्रमाणे मुलगा परत गेला आणि काही काळ लोटल्यावर तो परत आला; तेव्हां ब्राह्मणानें तोच प्रश्न पुन्हां त्याला केला आणि मुलानेंहि पुन्हां तेंच उत्तर दिले. ब्राह्मण म्हणाला, 'तुझ्या या साऱ्या विद्या व्यर्थ आहेत, तूं पुन्हां परत जा.' बापाच्या आज्ञेप्रमाणे मुलगा पुन्हां गुरुगृही गेला. काही काळ लोटल्यानंतर तो परत बापाकडे आला. त्याला पाहतांच बाप म्हणाला, 'मुला, आज मात्र तुझें तोंड ब्रह्मज्ञाप्रमाणे तेजोमय दिसत आहे.' परमेश्वराशी तुमची प्रत्यक्ष भेट होईल त्या वेळी तुमचा सारा नूर बदलून जाईल, तुमचा आवाज वेगळा होईल, किंबहुना तुम्ही सारेच बदलून जाल. अशा स्थितीत तुमचे अस्तित्व मानवजातीला आशीर्वादरूप होईल. तुमच्यापुढे सारे जग नम्र होईल. ऋषित्वाला उल्लंघन करण्याचे सामर्थ्य या विश्वांत कोणालाहि नाही. या स्थितीला ऋषित्व असें म्हणतात, आणि आमच्या धर्माचे अखेरचें साध्य म्हणजे हे ऋषित्व अथवा ही ब्राह्मी स्थिति प्राप्त करून घेणे हेच आहे. याखेरीज बाकीच्या साऱ्या गोष्टी केवळ दुय्यम प्रतीच्या असून त्यांचे महत्व पूर्वतयारीहून अधिक नाही. तात्त्विक वाद विवाद, अनेक दर्शनें, द्वैत, अद्वैत आणि फार काय पण प्रत्यक्ष शृतीचा अभ्यासहि याच दुय्यम स्वरूपाचा आहे. ब्राह्मी स्थिति प्राप्त करून घेणे हा मूलहेतु असून बाकीच्या साऱ्या गोष्टी या मुख्य हेतूची पोषक उपकरणे मात्र होत. ज्या ज्ञानाने ही ब्राह्मी स्थिति प्राप्त होते, तें ज्ञान प्रमुख असून बाकीचें सारे शास्त्रज्ञान दुय्यम प्रतीचे आहे. असे ज्ञान प्राप्त करून घेऊन जे ब्राह्मी स्थितीला पावले, त्यांनाच शृतींत ऋषि अशी संज्ञा प्राप्त झाली; आणि अशा प्रकारची स्थिति प्राप्त करून घेणे, हे आम्हांपैकी प्रत्येक खऱ्या हिंदूचे अवश्य<noinclude></noinclude> dtzbmrooaihpdbl5kl1pp5qn20nck1b पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१२ 104 66777 233165 233108 2026-07-15T06:49:22Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233165 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते|२०७ }} {{rule}}</noinclude>कर्तव्य आहे. याच स्थितीला मुक्ति असें नांव आमच्या शास्त्रांनी दिले आहे. अमुक ग्रंथावर अथवा वचनावर माझा विश्वास आहे असे म्हटल्याने ही स्थिति प्राप्त होत नाही; त्याचप्रमाणे हजारों यात्रा करून आणि हजारों देवतांची दर्शने करूनहि ही स्थिति प्राप्त होणार नाही. जगांतील साऱ्या नद्यांत कितीहि बुचकळ्या तुम्ही मारल्या, तरी तुम्हांस मुक्तिलाभ व्हावयाचा नाही. हा लाभ तुम्हांस करून घ्यावयाचा असेल तर तुम्ही मंत्रद्रष्टा बनले पाहिजे.<br>{{gap}}शृतिकाल सोडून आपण जरा अलीकडे आलों म्हणजे अवतारी पुरुषांचें दर्शन आपणांस होतें. सारे जग हालविण्यासारखें सामर्थ्य यांच्या अंगीं होतें. असे अवतारी पुरुष अनेक होऊन गेले असें भागवतांत सांगितले आहे. तथापि या अनेक पुरुषांपैकी राम आणि कृष्ण या दोहोंचेंच पूजन हिंदुस्थानांत होते. सत्य आणि नीति यांचा मूर्तिमंत पुतळा राम हा होता. पुत्र, भर्ता, भ्राता, राजा इत्यादि अनेक नात्यांनी रामाचे स्वरूप आदर्शवत् आहे. या रामावताराचें चरित्र महाकवि आणि मोठे ऋषिवर्य श्रीवाल्मीकि यांनी गाइलें आहे. यांच्या वाणीइतकी सुंदर, पवित्र आणि साधी वाणी दुसऱ्या कोठेहि आढळावयाची नाही. यांनी रामचरित्राबरोबरच सीतेचें चरित्रहि सांगितले आहे. हे चित्र या महाकवीने इतक्या बहारीच्या रंगांत रंगविलें आहे की, साऱ्या जगाचा काव्येतिहास तुम्ही पालथा घातला, तरी त्यांत दुसरी सीता तुम्हांस आढळावयाची नाही. सीता ही साऱ्या जगांत एकच. सीतेला तुलना सीतेचीच. ज्या काळी हे चरित्र घडून आले, त्यानंतर आजपर्यंत दुसरी सीता पुन्हां निर्माण झाली नाही. जे चरित्र एकदां रेखाटले गेलें तें आजपर्यंत अखेरचेच राहिले आहे. कदाचित् राम आजपर्यंत पुष्कळ होऊन गेले असतील, पण सीता मात्र एकटीच. सीता ही हिंदु स्त्रियांचा आदर्श आहे. स्त्री कशी असावी, या प्रश्नाचे उत्तर 'सीतेसारखी' या एकाच शब्दांत भरतभूमीनें कायमचे देऊन ठेविलें आहे; आणि आज हजारों वर्षे हा आदर्श आम्हांपुढे अबाधित राहिला असून अखिल आर्यावर्तातील कोट्यवधि स्त्रीपुरुषांचे आणि मुलांचे प्रणाम तो घेत आहे. प्रत्यक्ष पावित्र्याहून पवित्र असा हा आदर्श काळाच्या अंतापर्यंत असाच कायम रहावयाचा आहे. साऱ्या आयुष्यभर सीतेने दुःख मात्र भोगिलें, पण त्याविरुद्ध कधी चकारशब्दहि मुखावाटे काढला नाही. अशी ही पावित्र्याची मूर्ति सर्व जनतेची पूज्य देवी होऊन<noinclude></noinclude> h40co8dvgz5n72h8yc1f7eqxgnjkgud पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१३ 104 66778 233166 233109 2026-07-15T06:51:49Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233166 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२०८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>बसली आहे. मनुष्यांनीच काय, पण देवदेवतांनीही तिचे पूजन करावे, अशी तिची योग्यता आहे. अशी स्त्री साऱ्या आर्यावर्ताचें आधिदैवत होऊन बसली यांत नवल काय? सीतेचे चरित्र हिंदुस्थानांतील आबालवृद्धांच्या मुखी असते. सर्व पुराणे उद्या काळाच्या पोटांत गेली, शृती लोपल्या, संस्कृत भाषाहि नष्ट झाली, आणि पांच हिंदु शिल्लक राहिले तथापि त्यांच्या मुखांतून सीतेचे चरित्र ऐकावयास मिळेल. सीता साऱ्या आर्यवंशाच्या रोम रोमांत भिनून राहिली आहे, हे माझे शब्द तुम्हीं पक्के ध्यानात ठेवा. आमच्या स्त्रियांना सुधारण्याचा आणि त्यांना अर्वाचीन बनविण्याचा यत्न तुम्हीं कितीहि केला, तरी सीतेचा आदर्श सोडून त्यापलीकडे एक पाऊलही त्या सरकावयाच्या नाहीत. तुमचा उद्योग या दृष्टीने सुरू आहे अशी नुसती शंका त्यांना आली, तरी त्याक्षणीच तुमचे सारे यत्न ढांसळून पडतील. हा अनुभव आजपर्यंत शेकडों वेळां आम्हांस प्रत्यक्ष आला आहे. सीतेच्या पावलांमागें पावले टाकूनच आपला मार्ग हिंदु स्त्रीजाती आक्रमील; आणि असे होणे हे योग्यहि आहे.<br>{{gap}}यानंतर हिंदुस्थानांत आबाल वृद्धांस पूजनीय असा दुसरा अवतार झाला. अनेक रूपांनी या अवताराचे पूजन स्त्रिया आणि पुरुष करीत असतात. या दोघांनाहि तो सारखाच पूज्य आहे. तो बालकांचा जसा आवडता तसाच वृद्धांनाही तो प्रिय आहे. याच्या संबंधी बोलतांना या अवतारांत परमेश्वर पूर्णत्वाने अवतरला असे उद्गार भगवान् व्यासांनी काढिले आहेत. त्यांच्या दृष्टीने इतर अवतार परमेश्वराचे केवळ अंशरूप असून श्रीकृष्ण मात्र पूर्णावतार होत. भगवान् श्रीकृष्णाच्या चरित्राचा विचार केला म्हणजे या व्यासोक्तीबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. भगवान् श्रीकृष्ण संन्याशांत संन्यासी होते आणि त्याबरोबरच गृहस्थाश्रम्यांत गृहस्थाश्रमी होते. त्यांचा संन्यास जसा पूर्ण, तसाच गृहस्थाश्रमहि पूर्णत्वास पावलेला होता. त्यांच्या अंगी अतुल शक्ति होती; तथापि ह्या स्थितीतहि ते पूर्ण विरागी होते. गीताशास्त्र उत्तम समजल्याशिवाय भगवान् श्रीकृष्ण यांच्या चारित्र्याचे रहस्य तुमच्या ध्यानी यावयाचे नाही. गीतेंत त्यांनी स्वतःच जी तत्त्वे सांगितली, त्यांचे मूर्तिमंत रूप त्यांच्याच ठिकाणी व्यक्तदशेला आले होते. सारे अव तारी पुरुष अशाच स्वरूपाचे होते. जे तत्त्व तोंडाने उच्चारावयाचें तेंच<noinclude></noinclude> 6ova6wkqi19rpejo0k1gpdh86ym9aba पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१४ 104 66779 233167 233110 2026-07-15T06:55:11Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233167 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते|२०९ }} {{rule}}</noinclude>प्रत्यक्ष कृतींतहि ते दाखवीत. भगवान् श्रीकृष्णाचें सारें चरित्र गीताशास्त्राला पूर्णपणे धरून आहे. सर्व कर्म करावयाचें परंतु त्यांत कोठेहि गुंतावयाचे नाही, या त्यांच्या उपदेशाचे जीवंत स्पष्टीकरण त्यांच्या साऱ्या चरित्रभर आढळून येते. त्यांनी सिंहासनाचा त्याग केला. आपणांस कधी काळी सिंहासन होते, याची आठवणहि त्यांस पुन्हां झाली नाही. ज्यांच्या दृष्टिपाताने संबंध राज्ये उलथींपालथी झाली, त्यांनी स्वतः राजा होण्याची अपेक्षा धरिली नाही. लहानपणी गोपीबरोबर खेळणारा कृष्ण अखेरपर्यंत तसाच साधा भोळा कृष्ण राहिला. गोपींची क्रीडा हा श्रीकृष्णांच्या आयुष्यातील एक लोकोत्तर भाग आहे. या चरित्राचा हा भाग आपणांसारख्या सामान्य जनांस समजणे शक्य नाहीं; आणि स्वतः पूर्ण पवित्र बनेपर्यंत तो समजण्याची आशाहि कोणी धरूं नये. अत्यंत पवित्र अशा प्रेमाचें हे स्वरूप येथे अत्यंत विशाल झाले आहे. वृंदावनांतील गोपीक्रीडेचे रहस्य कोणालाहि समजावयाचें नाही. भगवान् श्रीकृष्णाच्या भक्तिरसाचें आकंठ पान करून जो झिंगला असेल त्यालाच हे रहस्य समजेल. गोपींच्या शुद्ध आणि निर्व्याज प्रेमाच्या वाहणाऱ्या झऱ्याचे आकलन कोणास करवेल! ज्या प्रेमांत स्वर्गाची अपेक्षा नाही, ज्या प्रेमांत मृत्युलोकाच्या अस्तित्वाचाहि विसर पडला आणि ज्या प्रेमांत मुक्तीचीही अपेक्षा शिल्लक राहिलेली नाही त्याचे रहस्य कोणी जाणावें? व्यक्त परमेश्वर आणि त्याचेच अव्यक्त रूप या दोन मतांतील तंट्याचा निकाल येथेच लागलेला आहे हे अवश्य ध्यानात ठेवा. मानवी जीविताचे अत्युच्च शिखर म्हणजे व्यक्त परमेश्वर असून अव्यक्त रूप हे फक्त तत्त्वदृष्ट्या जाणावयाचे आहे. अव्यक्त रूप सर्व विश्वभर पसरले असून हे सारे वस्तुजात त्याचेच स्पष्ट रूप आहे. केवळ शास्त्रदृष्ट्या हे म्हणणे आपणांस पटले असले, तरी आपल्या मनोभूमिकेला कोणत्या ना कोणत्या व्यक्त स्वरूपाची आवश्यकता भासत असते. जे आपल्या डोळ्यांनी पाहतां येईल, ज्याचे ग्रहण सर्व इंद्रियांनी करितां येईल आणि ज्याच्या पायांपाशी आमचे सर्व अंतर्गत आम्हांस खुलें करितां येईल, असें स्वरूप आम्हांस हवे. अशा दृष्टीनेच एखाद्या विशिष्ट रूपाची योजना आम्ही माणसें करीत असतो. याचा अर्थ हाच की, व्यक्त परमेश्वर म्हणजे मानवी मनाची अत्युच्च कोटीची कल्पना तथापि शुद्ध बुद्धीने येथपर्यंत मजल<noinclude><Br>{{gap}}स्वा० वि० ख०-९-१४</noinclude> 0hcg76fwbykwzvsaqqnwh8tq25olj2i पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१५ 104 66780 233154 154835 2026-07-15T06:05:21Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233154 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>मारली म्हणजे तिची तिलाच भीति वाटून ती येथे थबकून उभी रहाते. हा प्रश्न आजकालचा नसून त्याची चर्चा फार प्राचीन काळापासून चालत आल्याचे आपल्या निदर्शनास येतें. ब्रह्मसूत्रांत ही चर्चा आहे. अरण्यवासांत असतां द्रौपदी आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये हीच चर्चा झाली होती. अत्यंत दयामय आणि सर्वशक्तिमान् असा व्यक्त परमेश्वर खरोखर अस्तित्वांत असेल तर पृथ्वीवर ही नरकाची उत्पत्ति का होते? अशी विचित्र सृष्टि त्याने का निर्माण केली? असा परमेश्वर न्यायी नसून पक्षपाती म्हटला पाहिजे. या प्रश्नावलीला चोख उत्तर आपणांस देता येत नाही. त्याला एकच उत्तर गोपींच्या प्रेमाने दिले आहे. भगवान् श्रीकृष्णाच्या मागे कोणतेंहि विशेषण लावलेलें गोपींना खपलें नाही. फार काय, पण हे सारे विश्व त्याने निर्माण केले की नाही, हा प्रश्नसुद्धा त्यांच्या चित्तांत आला नाही. तो सर्वशक्तिमान् आहे की अगदी दुबळा आहे, असली चर्चा त्यांनी कधी केली नाही. तो अनंत प्रेमस्वरूप आहे एवढे मात्र त्यांना ठाऊक होते. याखेरीज दुसरें कोणतेंहि स्वरूप त्यांना ठाऊक नव्हते आणि ते माहित व्हावें अशी अपेक्षाहि त्यांनी केली नाही. कृष्ण म्हणजे वृंदावनांतला प्रेममय कृष्ण, ही एकच व्याख्या त्यांना ठाऊक होती. तो दुष्टांचे दमन करणारा आणि राजांचा राजा त्यांच्या दृष्टीने केवळ गोप होता, आणि अखेरपर्यंत त्यांना तो गोपच राहिला. 'मला धन नको, आप्तसोयरे नकोत, मला विद्येची गरज नाही, मला स्वर्गसुख नको, अथवा मुक्तिहि नको. फक्त तुझी भक्ति माझ्या चित्तांत दृढ असावी आणि तीहि अत्यंत निर्व्याज असावी,' इतकेंच त्यांचे मागणे होते. धर्माच्या इतिहासांत हे एक मोठे ध्वजेचे स्थल आहे. निर्व्याज प्रेम हे या स्थानाचे मुख्य स्वरूप आहे. यांतूनच पुढे निर्व्याज कर्म उत्पन्न झाले; आणि अनासक्त चित्ताने कर्म करावे हा सिद्धांत भगवान् श्रीकृष्णांनीच प्रथम बोलून दाखविला आहे. हिंदुस्थानच्या भूमीवर मानवजातीच्या इतिहासांत हे तत्त्व अशा रीतीने प्रथम उदयास आले. भीतीची भक्ति आणि व्यापारी भक्ति यांचा निःपात झाला; नरकाची भीति उडाली आणि स्वर्ग सुखाची आकांक्षा नाहीशी झाली; आणि त्याची जागा निर्व्याज प्रेम आणि अनासक्त कर्म या दोन अत्युच्च तत्त्वांनी बळकाविली. <br>{{gap}}आणि या प्रेमाचे स्वरूप तरी कसें आहे पहा. गोपीचें प्रेम आपणास समजावयाचे नाही, हे मी नुकतेच तुम्हास सांगितले आहे. या दिव्य प्रेमाचा<noinclude></noinclude> bksq6z4svxvdbzoyavfsri00zvf7385 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१६ 104 66781 233155 154836 2026-07-15T06:08:37Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233155 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|२११ }} {{rule}}</noinclude>अर्थ लक्षात आला नसतांहि त्याचा विपर्यास करणारे हजारों मूर्ख आजहि आपल्या समाजांत तयार आहेत. 'गोपीचे प्रेम' हा शब्द उच्चारतांच ज्यांना थरकाप भीति वाटते, शुद्ध नरकासन्निध तर आपण आलों नाहींना अशी शंका उत्पन्न होऊन त्यांचे चित्त भयाकुल होते. याचा वास्तविक अर्थ हाच की त्यांची चित्तें अपवित्र आहेत. आपल्याच रक्तामासाचे असे अनेक मूर्ख आपणांमध्ये आज वावरत आहेत. त्यांना मी इतकेंच म्हणतों की बाबांनो, आपली अंतःकरणे आधी शुद्ध करा. गोपीचा इतिहास प्रत्यक्ष शुकदेवाने स्वमुखानें गाइला आहे, एवढे तरी लक्षात ठेवा. ज्याने हा इतिहास गाइला तो दुसरा तिसरा कोणी नसून बाल ब्रह्मचारी होता. जो सदाचा पवित्र त्या पवित्रतम शुकदेवाने गोपींच्या प्रेमाचा हा उज्वलतम इतिहास सांगितला आहे. आपल्या चित्तांत कसलीहि आकांक्षा यस्किंचित तरी शिल्लक असेल तोपर्यंत ईश्वरविषयक प्रेमाच्या अत्यल्प किरणाचाहि प्रवेश तेथे व्हावयाचा नाही. असे होणे ही गोष्ट सर्वथा अशक्य आहे. काहीतरी आकांक्षा चित्तांत शिल्लक ठेवून परमेश्वराचे भजन करणे आणि वाण्याचे दुकान घालणे ही कर्मे सारख्याच योग्यतेची आहेत. परमेश्वरा, मी तुझी भक्ति करितों तिच्या बदल्यात मला अमुक दे असे म्हणणे हे वाणिज्य नव्हे तर काय? यावर परमेश्वरहि उलट म्हणू लागतो की, ठीक आहे; अमुक कर्म तूं केले नाहीस, तर तूं मेल्यावर पाहून घेईन. तुला तापलेल्या तव्यावर भाजून काढीन. असल्या प्रकारच्या क्षुद्र कल्पनांना आमच्या चित्तांत अस्तित्व आहे, तोपर्यंत वेडे करणारे गोपींचे प्रेम आम्हांस कोठून समजणार? तें समजून घेण्याची इच्छा असेल तर धनतृष्णा आणि कीर्तितृष्णा आपल्या हृदयांतून प्रथम हद्दपार करा आणि या क्षणभंगुर जगाचे अस्तित्वहि विसरून जा. असे झाले तरच गोपींच्या प्रेमाची थोडी तरी कल्पना तुम्हांस येईल. या प्रेमाला जगाचा स्पर्श झाला की, तें ताबडतोब विटाळते. मोठे नांव, मोठी कीर्ति, विपुल संपत्ति इत्यादि ऐहिक तुच्छ पदार्थांचा पूर्ण विसर तुम्हांस प्रथम पडू द्या. तसे झाले तरच गोपींच्या प्रेमाचे रहस्य तुम्हांस समजेल. या प्रेमाचे स्वरूप इतकें पवित्र आहे की, ऐहिक वस्तूंच्या पापाचा संपर्कहि त्याला खपावयाचा नाही. जीवात्मा पूर्ण निष्कलंक होईपर्यंत या प्रेमाचा अंशहि त्याला सांपडावयाचा नाही. स्त्री पुरुष भावना, पैशाची हांव आणि कीर्तीची इच्छा यांच्या उकळ्यांवर उकळ्या आमच्या चित्तांत फुटत<noinclude></noinclude> 80m3i311mom42m67mbfg4xhh2ukmsdn पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१७ 104 66782 233156 154837 2026-07-15T06:11:09Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233156 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>असतांना गोपींच्या प्रेमाची मीमांसा करून त्याचे रहस्य जाणण्याची इच्छा करणे हे शुद्ध वेडेपण आहे. असे करण्याची छाती तरी आम्हांस कशी होते, याचेच मला मोठे नवल वाटते. कृष्णावताराचें सारें रहस्य या एकाच कथेत सांठविलेले आहे. साऱ्या अवतारकार्याचा अर्क येथे उतरला आहे. फार काय, पण तत्त्वमंदिरावर कळसाच्या जागी शोभणारी जी गीता तीहि गोपीप्रेमाच्या आवेशापुढे फिकी पडते. मानवी जीविताचें अंतिम साध्य दाखवून त्याकडे हळू हळू प्रवास कसा करावा हे गीतेने सांगितले आहे. हा सारा मार्ग लांब पल्ल्याचा आणि कंटाळवाणा आहे. भक्तिरसाचे आकंठ पान करून त्याच्या धुंदीत साऱ्या विश्वाला तुच्छ लेखणारा आदेश गीतेत नाही. ज्या ठिकाणी गुरु आणि शिष्य, अध्ययन आणि अध्यापन, ग्रंथ आणि तत्त्वविचार, ही सारी एकरूप होऊन दुजेपणाचे भानहि जेथें उरत नाही, असलें भक्तिरसाने उत्पन्न होणारे शुद्ध वेड गीतेंत कोठे आहे? ज्या ठिकाणी परमेश्वराचे अस्तित्वहि लय पावतें, ज्या ठिकाणी स्वर्ग आणि वैकुंठ असल्या कल्पनांचाहि उदय होत नाही, अथवा ज्या ठिकाणी भीति, हर्षविषादादि ऐहिक भावनांचा पुसटहि वास नसतो, असली धुंदी गीतेंत कोठे आहे? येथे सर्व दुजेपणाचा पूर्ण लय झाला आहे, आणि जे काही उरलें तें शुद्धप्रेमाचे वेड. या ठिकाणी कृष्णावांचून दुसऱ्या कशाचेंहि भान त्याच्या भक्ताला होत नाही. तो जिकडे पाहील तिकडे एक कृष्णच त्याला दिसत असतो. बाह्य जगांत काय, अथवा अंतःसृष्टीच्या अगदी अतर्मदिरांत काय, कृष्णरूपावांचून दुसरा कशाचाहि प्रत्यय त्याला येत नाही. अखिल सृष्टीला तो कृष्णरूपाने पहातो, आणि स्वतःचे मुखहि त्याला कृष्णस्वरूप दिसते. त्याचा जीवात्माहि शुद्ध कृष्णमय होऊन गेलेला असतो. कृष्णचरिताच्या या भागांत सांठविलेलें. रहस्य हेच आहे.<br>{{gap}}कृष्णचरिताचा अभ्यास ज्याला करावयाचा असेल, त्याने बारीकसारीक तपशीलाच्या नादी लागू नये. केवळ ठोकळ दृष्टीने या चरित्राचा जेवढा सांगाडा दिसेल तोच हिशेबी घेऊन त्यांतील खरें रहस्य कोठे आहे एवढाच शोध करावा. केवळ ऐतिहासिक दृष्ट्या यांत पुष्कळ विषम गोष्टी आढळून येतील, कित्येक ठिकाणी परस्परविरोधहि दिसेल, कित्येक ठिकाणी एखाद्या अनधिकाऱ्याने घुसडून दिलेल्या गोष्टींची खिचडी झाली असेल. या साऱ्या<noinclude></noinclude> c3lbyef2d5xntdzmzw14ier6x4nlzdy पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१८ 104 66783 233157 154843 2026-07-15T06:17:13Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233157 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|२१३ }} {{rule}}</noinclude>गोष्टी खऱ्या असतील; तथापि या साऱ्यांना काही तरी मूळ पाया असला पाहिजे. इतका एकच मुद्दा तुम्ही ध्यानांत धरा. एवढी मोठी प्रचंड इमारत पायावांचून उभी राहिली नाही हे निःसंशय सिद्ध आहे. याकरितां बारीकसारीक गोष्टींचा मेळ घालण्याच्या भानगडीत न पडता, मुख्य मुद्दा लक्षात घेऊन त्याचे रहस्य जाणावें हेच आपणांस उचित आहे.<br>{{gap}}कोणत्याहि अवतारी पुरुषाचें चरित्र तुह्मीं पाहिले तर त्याचा अवतार होण्याच्या पूर्वी जो काही कल्पनासमूह अस्तित्वात होता, त्याचेच उत्क्रांत रूप त्या अवतारी पुरुषाच्या द्वारे व्यक्त झाले आहे, असे आपल्या निदर्शनास येईल. त्या त्या देशांत त्या त्या काळी जी धर्मतत्त्वे इतस्ततः वावरत होती, त्यांचे एकीकरण करून ती सुसंबद्ध रूपाने जनतेस शिकविण्याचे कार्य तो करीत असतो. दीर्घ काळानंतर असा एखादा पुरुष वास्तविक अस्तित्वांत तरी होता की नाही अशी शंका उत्पन्न होऊं लागणे हल्ली साहजिक आहे. पण तसे झालें तरी त्याने सांगितलेलें तत्त्वज्ञान नष्ट झालेले नसते. जगांत ते सदोदित जिवंत रूपाने वावरत असते. निष्काम कर्म, निष्काम प्रेम, आणि कृष्णाने सांगितलेले दुसरें तत्त्वज्ञान या वस्तू आज मेलेल्या आहेत काय? त्यांचे सजीव अस्तित्व आपल्या डोळ्यांनी आज आपणांस दिसत नाही काय? मग ही तत्त्वे कोणातरी एका व्यक्तीपासून उद्भवली असली पाहिजेत असे आम्ही म्हटले तर त्यांत चूक काय आहे? ही तत्त्वे आकाशांतून पडली आणि धरणीवर सांवरली असें तर झाले नाही हे खास. मग ती जेथून प्रथम निर्माण झाली असें एक मूलस्थान असले पाहिजे, असे म्हणणे चुकीचे आहे काय? या तत्त्वांचा प्रचार भगवान् श्रीकृष्णांनी प्रथम केला, असे म्हणण्यांत आम्ही कांहीं चूक करीत नाही. भगवान् श्रीकृष्णांनी आरंभिलेले हे कार्य भगवान् श्रीव्यासांनी पुढे चालविलें. कृष्णचरित्रांतील सर्वश्रेष्ठ भाग गोपीचरित हाच होय; आणि कृष्णाला लावण्यात येणाऱ्या अनेक विशेषणांत 'गोपीजनवल्लभ' हे विशेषण सर्वश्रेष्ठ आहे. या भक्तिरसाच्या आवेशाने तुमच्या मेंदूत प्रवेश केला म्हणजे मंगलमय गोपीचे रहस्य तुम्हांस समजेल आणि त्याच वेळी खरी भक्ति म्हणजे काय याचाहि उलगडा होईल. या वेळी सारे जग तुम्हांस अदृश्य होईल, साऱ्या कल्पना, भावना आणि आकांक्षा चित्तांतून पार वितळून जातील. तुमचें चित्त नितांत शुद्ध होईल आणि भक्तीशिवाय दुसरी<noinclude></noinclude> ht2n5jgwt5jadn9ntob520tdusdmpfo पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२१९ 104 66784 233158 154845 2026-07-15T06:23:27Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233158 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>असलीहि आकांक्षा तेथे राहणार नाही. फार काय पण सत्य वस्तूच्या शोधांत आपण होतो हेहि स्मरण तुम्हांस राहणार नाही. इतके झाले म्हणजे गोपींच्या निष्काम प्रेमाचा प्रचंड ओघ तुम्हांला अंतर्बाह्य भरून टाकील. मानवी जीविताचा अंतिम हेतु हाच आहे. हे साधले म्हणजे सर्व काही साधेल.<br>{{gap}}आतां कृष्णचरितांतील याहून अलीकडच्या पायरीचा विचार करूं. हा गीताकथन करणारा कृष्ण होय. गीते संबंधी विचार मनांत आला, म्हणजे आमच्या देशांत या बाबींत चालत असलेल्या विलक्षण तंट्याची आठवण झाल्यावांचून रहात नाही. हे तंटे अर्वाचीन काळीच सुरू झाले आहेत. गोपीजनवल्लभ श्रीकृष्ण ही व्यक्ति आमच्यांतील काही पंडितंमन्यांस आवडत नाहींशी दिसते; आणि याचे कारण हेच की, युरोपियन पंडितांस ती आवडत नाही. डाक्टर अमुकतमुक यांच्या पसंतीस ती उतरत नाही. बस; त्या गोपींनी आणि त्या श्रीकृष्णाने निजधामास गेलेच पाहिजे. अहो युरोपीय पंडितांच्या परवानगीशिवाय कृष्ण जगू तरी शकेल काय? छे, ही गोष्ट कधीच शक्य नाही. याकरिता असा गोपीजनवल्लभ कृष्ण कधी अस्तित्वांतच नव्हता असा पुरावा मिळविला पाहिजे. महाभारतांत एकदोन स्थळांशिवाय गोपींचा उल्लेख कोठेहि नाही; आणि ती स्थळेहि महत्वाची आहेत असें नाही. द्रौपदीने केलेल्या श्रीकृष्णस्तुतींत वृदावनांतील कृष्णचरित्राचा उल्लेख आहे; त्याचप्रमाणे शिशुपाळाच्या एका भाषणांतहि वृंदावनाचा उल्लेख आहे. पण तसे असले म्हणून काय झाले? ही स्थळे क्षेपक आहेत असे म्हणावें. युरोपियांना जे आवडत नाही ते अर्थातच त्याज्य असल्यामुळे फेकून देणें अवश्य आहे. याकरता जेथे जेथें गोपी आणि श्रीकृष्ण असे उल्लेख आढळतील ती स्थळे क्षेपकच असली पाहिजेत. ठीक आहे. जी माणसें शुद्ध वाणिज्यांत डोक्याच्या वर बुडून गेली आहेत, आणि ज्यांची धर्मसाधने आणि साध्यहि शुद्ध दुकानदारीच्या प्रकाराची झाली आहेत, त्यांनी असा प्रकार करावा यांत नवल नाही. येथे काही धर्मसाधन करावयाचें तें पुढे स्वर्गसुख मिळावे म्हणून. या वाणगटांना आपले भांडवल चक्रवाढ व्याजांत गुंतविण्याची इच्छा आहे. येथे एक पैसा दिला म्हणजे स्वर्गात एक रुपया मिळेल, या हिशेबाने आपली सर्व कामें हे करीत असतात. असल्या प्रकारच्या विचारसरणीत गोपीना स्थान मिळू नये हे सर्वथैव योग्य आहे!<noinclude></noinclude> fljy5bpiwxwl2km9t23l8snj9wz4ob3 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२० 104 66785 233159 154846 2026-07-15T06:26:22Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233159 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|२१५ }} {{rule}}</noinclude>कारण, गोपींना वाणिज्य ठाऊक नव्हते. कोणत्या प्रकारच्या भक्तीचे फळ कोणत्या प्रतीचे मिळते हा हिशेब त्यांना समजत नव्हता. मग असल्या गैरहिशेबी गोपी ह्या वणिजनांना खपणार कशा?<br>{{gap}}आतां गोपींच्या निष्काम भक्तीचें हें अत्युच्च वातावरण सोडून आपण जरा अलीकडे येऊ. श्रुतींचा खरा अर्थ भगवद्गीतेंत जसा स्पष्ट झाला आहे, तसा दुसऱ्या कोठेहि तो पाहण्यांत येत नाही. किंबहुना, याहून अधिक स्पष्ट अशा स्वरूपाचे श्रुतींचे विवरण करणेहि शक्य नाही. श्रुति आणि आरण्यके यांचे रहस्य जाणणे फार कठिण आहे. यांचा अर्थ जो तो आपापल्या परी लावू पहात असतां मतांचा आणि मतांतरांचा विलक्षण गलबला झाला आहे असें पाहून परमेश्वराने स्वतः अवतार धारण केला. ज्याच्या श्वासापासून श्रुती उद्भवल्या, त्यानेच त्यांचा खरा अर्थ सांगितला पाहिजे हे उघड आहे; आणि तो अर्थ सांगण्याकरितांच भगवान् श्रीकृष्ण अवतरले आणि गीतेच्या रूपाने हे विवरणाचे कार्य त्यांनी केले. श्रुतींच्या याहून अधिक चांगल्या अर्थाची गरज हिंदुस्थानाला नाहीं; आणि जगालाही ती नाही. श्रुति आणि आरण्यकें यांवर ज्या काही टीका गीतातत्त्वानंतर झाल्या, त्या टीकाकारांनाहि पुष्कळ प्रसंगी श्रुतींचे रहस्य समजले नाही. त्या ओघाची दिशा त्यांच्या ध्यानात आली नाही हे मोठे नवल आहे. एखाद्या अद्वैतवाद्याने एखाद्या उपनिषद् ग्रंथावर टीका सुरू केली म्हणजे त्यांत पुष्कळ विलक्षण प्रकार तो करितो. मूळ संहितेंत द्वैतप्रतिपादक कांहीं मजकूर आला की, त्याची विलक्षण ओढाताण करून आणि त्याला हवातसा पिळवटून त्यांतून स्वमतप्रतिपादक असा अर्थ तो निर्माण करितो. अशा रीतीने एकंदर संहितेला आपले मत बोलून दाखवावयास तो लावीत असतो. असला प्रकार गीतेंत तुम्हांला कोठेही आढळावयाचा नाहीं; कारण, मनुष्यप्राण्याची उत्क्रान्ती पायरीपायरीने होत असते, हा सिद्धांत भगवंताला पूर्णपणे अवगत आहे. याकरितां द्वैत आणि अद्वैत या पायऱ्या आपापल्या ठिकाणी असणें हें उचित आहे, असे तो म्हणतो. जडाकडून सूक्ष्माकडे, सूक्ष्माकडून सूक्ष्मतराकडे आणि द्वैतापासून शुद्ध अद्वैताकडे मनुष्यप्राण्याचा प्रवास हळू हळू होत असतो हे तो जाणून आहे. गीतेंतही हेच अनुसंधान सर्वत्र बाळगिले आहे. कर्मकांडाचा विचारहि गीतेने केला आहे, आणि कर्म प्रत्यक्ष मोक्षादायी नसले तरी परंपरेने मोक्षमार्गावर तुम्हांस तें<noinclude></noinclude> qayh8imoksa8b4btp2j6xwgzpdzh9fs पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२१ 104 66786 233160 154849 2026-07-15T06:29:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233160 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>आरूढ करितें असें तेथे दर्शविलें आहे. पूर्ण कर्मसंन्यास इष्ट असला तरी कर्म त्याज्य नाही. मूर्तिपूजा अखेरचे फळ देत नसली तरी मूर्ति त्याज्य नाही. यज्ञ यागादि क्रिया मोक्षदायी नसल्या, तरी मधल्या मुक्कामाच्या पायऱ्या म्हणून त्याही इष्ट आहेत. सारांश इतकाच की, चित्ताची शुद्धि होण्याकरितां ह्या एकाच हेतूने जी जी क्रिया घडेल ती सारी इष्टच आहे. परमात्मपूजन हेहि इष्ट आहे. कारण, त्या मार्गानेंहि अखेरची सिद्धि प्राप्त होणारी आहे. शुद्ध चित्ताने मूर्तीची पूजा तुम्ही केली तर तीहि इष्टफलदायी होईल. अखेरच्या मुक्कामाकडे जाणारे हे अनेक मार्ग आहेत- आणि इतके अनेक मार्ग असणे हे अवश्यहि आहे. मनुष्यजातीला त्यांची आवश्यकता नसती तर ते निर्माण तरी का झाले असते? अनेक धर्म आणि अनेक पंथ ही शुद्ध भोंदूंची क्रिया आहे असे म्हणण्याचे कारण नाही. आपमतलबी लोकांनी स्वार्थसाधूपणानें ही जाळी निर्माण केली आहेत असे नाही. केवळ स्वतःचे खिसे भरावे म्हणून या गोष्टी कोणीहि केलेल्या नाहीत. आमच्या अर्वाचीन पंडितांचा तसा समज असेल तर ती नाइलाजाची गोष्ट आहे. त्यांची मतें शुद्ध बुद्धिवादाला पटण्यासारखी दिसत असली तरी त्यांत सत्याचा अंशहि नाही. हे धर्म आणि हे पंथ यांची उत्पत्ति कोणीही केवळ स्वार्थासाठी केलेली नाही. जीवात्म्याला असलेल्या आवश्यकतेंतूनच ते निर्माण झाले आहेत. मागणीला अनुरूप अशाच वस्तू नेहमी निर्माण होत असतात. 'पिंडे पिंडे मतिर्भिन्ना' या न्यायाने या वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक मतींची तृष्णा शांत करण्याकरिता हे पंथ निर्माण झाले आहेत. याकरितां त्यांजवर एवढे निकराचे हल्ले करण्याचे काहीच कारण नाही. त्यांची जरूरी नाहीशी झाली, की तेही आपोआप नाहीसे होतील; आणि त्यांची जरूरी आहे, तोपर्यंत त्यांजविरुद्ध कितीही कडक टीका तुम्हीं केली अथवा आपली मनगटें तुम्ही कितीहि चावली तरी ते जिवंत राहणारच. तरवारीचा मोठा लखलखाट तुम्ही करा अथवा प्रचंड तोफखाने लावा, काही झाले तरी त्यांचे अस्तित्व राहणारच. सर्व एक धर्म करण्याच्या हेतूने मानवी रक्ताच्या नद्या तुम्ही वाहविल्या तरी मूर्तीचे अस्तित्व नाहीसे होणार नाही. हे अनेक पंथ म्हणजे विश्वव्यापी धर्मातील अनेक पायऱ्या होत; आणि त्यांचे अस्तित्व का आहे याचा उलगडा भगवान् श्रीकृष्णांनी गीतेंत उत्तम प्रकारे केला आहे.{{nop}}<noinclude></noinclude> akiv7mxtkqyvauh2laqvb4fu0n1n487 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२२ 104 66787 233161 154870 2026-07-15T06:38:17Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233161 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|२१७ }} {{rule}}</noinclude>{{gap}}आता यापुढे हिंदुस्थानांतील धर्माच्या इतिहासाचा दुःखद काल सुरू होतो. गीतेच्या कालीहि मतामतांतील द्वंद्वांस सुरवात झाली असावी असें दिसते. सारे तंटे आणि द्वंद्व मोडून सर्वत्र सलोखा आणि एकवाक्यता निर्माण करण्याकरितांच परमेश्वर श्रीकृष्णरूपाने अवतरला. भगवान् म्हणतात, 'मयिसर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव ।' या द्वंद्वांस प्रारंभ झाला त्याच्या अगोदरच्या काळी या सर्व मतांत सहिष्णुता नांदत असावी असे मानण्यास जागा आहे. यानंतर वेगवेगळ्या मतांतच युद्धास सुरवात झाली असें नसून जातिभेदहि बळावत गेला; आणि जातीजातीतहि परस्पर तंट्यास सुरवात झाली. हिंदुसमाजरचनेत क्षत्रिय आणि ब्राह्मण हे दोन प्रमुख आणि सामर्थ्यवान् वर्ण आहेत. आणि याच वर्णात प्रथम युद्धास सुरवात झाली. समाजाच्या थेट अत्युच्च शिखरावरून निघालेला रणनदीचा हा ओघ साऱ्या हिंदुस्थानभर पसरला; आणि सारा आर्यावर्त त्याखाली बुडून गेला. सुमारे हजार वर्षेपर्यंत अशी परिस्थिति राहिल्यानंतर दुसरा एक देदीप्यमान तारा हिंदभूमीच्या क्षितिजावर उदयास आला. हा गौतम शाक्यमुनि होय. बुद्धदेवाची मतें आणि त्याने सांगितलेला धर्म यांची सामान्य माहिती बहुधा आपणा साऱ्यांस आहेच. भगवान् बुद्धदेवालाहि आम्ही अवतारी पुरुष मानतो. जगांत अत्युच्च नीतीचा धडा बुद्धदेवाने प्रथम शिकविला. बुद्धदेव महान् कर्मयोगी होता. भगवान् श्रीकृष्णांनी गीतेत प्रथम परोक्षतत्वांचे विवेचन केले आणि त्यांचा प्रत्यक्ष आचार कसा करावा हे शिकविण्याकरितांच जणूं काय बुद्धदेवाच्या रूपाने ते पुनः अवतरले. <br>{{gap}}'''स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात्''' हा गीतेचा ध्वनि भरत भूमीत पुनः वावरू लागला. ''''स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः तेऽपि यांति परां गतिम्'''' असे म्हणण्याचा काळ पुनः आला. सर्वांच्या शृंखलांचे पाश तुटून गेले. ज्ञानमंदिराकडे जाण्याचा रस्ता सर्वांना मोकळा झाला. '''इहैव तैर्जितः स्वर्गः येषां साम्ये स्थितं मनः।''' या तत्त्वरत्नाचा उच्च घोष पुनः सुरू झाला. या गीतेंतील वचनांचा आचार प्रत्यक्ष उदाहरणाने दाखविण्याकरिता भगवान् श्रीकृष्ण शाक्यमुनीच्या रूपाने अवतरले. या अवतारांत राजांचें आणि साम्राज्यांचे कार्य त्यांनी केले नाही. शाक्य मुनीचा अवतार दीन दुबळ्यांकरितां होता. शाक्यमुनींनी देवांच्या गीर्वाण वाणीचाहि त्याग करून<noinclude></noinclude> rodtsketpl28rv2mq6xjrf57dkr52v7 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२३ 104 66788 233162 154874 2026-07-15T06:40:43Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233162 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२१८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>सामान्यांच्या वाणींत आपल्या उपदेशाचे कार्य केले. आपला उपदेश सामान्य जनतेच्या अंतःकरणापर्यंत थेट पोंचावा म्हणून तिच्याच भाषेत ते बोलू लागले. दरिद्री, दुःखी आणि क्षुद्र अशा लोकांचा सहवास प्रत्यक्ष घडावा म्हणून राज्यासनादि त्यांनी दूर झुगारून दिले. रामाप्रमाणेच शाक्य मुनींनीहि अंत्यजाला निर्भर आलिंगन दिले.<br> {{gap}}भगवान् शाक्यमुनींचे अवतारकार्य आणि त्यांचे जीवनचरित्र सर्वांस ठाऊक आहेच. पण अत्यंत दुःखाची गोष्ट ही की, त्या कार्याचा उपयोग व्हावा तितका झाला नाही. हा दोष शाक्यमुनींचा नाही हे उघड आहे. त्यांचे चरित्र अत्यंत पवित्र आणि अत्यंत उज्वल होते याबद्दल कोणास शंकाही येणार नाही; पण त्या वेळी हिंदुस्थानांत ज्या असंस्कृत जाती होत्या, त्यांना इतकी उच्च तत्त्वें पचण्यासारखी नव्हती. आर्याबरोबर इतर पुष्कळ रानटी जातीहि त्या काळी मिसळल्या होत्या. आपले रानटी पूजनप्रकार आणि पुष्कळसे धर्मवेड ही बरोबर घेऊन आर्यांच्या किल्ल्यांत त्यांनी प्रवेश केला होता. आर्यांच्या संस्कृतीची छाप त्यांजवर पडली असावी असे आरंभी वाटले, पण हा निवळ भ्रम होता. एक शतकहि पुरे लोटलें नाहीं तोच त्यांनी आपल्या टोपलीतले सर्प आणि आपली सारी भुतावळ बाहेर काढली. आपल्या साऱ्या प्राचीन पूर्वजांची ही संपत्ति बाहेर काढून ती साऱ्या हिंदुस्थानभर त्यांनी वांटून दिली; आणि अशा रीतीने आर्यावर्ताच्या धर्माची अवनती होऊन तो देश धर्मभोळेपणाचें एक साम्राज्य बनून गेला. आरंभींच्या बुद्धानुयायांनी पशुहनन बंद करण्याकरितां वेदप्रणीत यज्ञयागांवर मोठ्या निकराचा हल्ला केला. प्राचीन काळी प्रत्येक घरी यज्ञ होत असे; आणि धर्मसाधनाचा मुख्य मार्ग तोच गणला जात असे. बौद्धांच्या हल्ल्यांनी या क्रिया बंद पडल्या; आणि त्यांच्या जागी भपकेबाज देवालये, भपकेबाज पूजोपचार आणि स्वयंमन्यमान पुजारीवर्ग या वस्तू निर्माण झाल्या. या साऱ्यांचे अस्तित्व हिंदुस्थानांत आज आपणांपुढे प्रत्यक्ष आहेच. ब्राह्मणांच्या मूर्तिपूजेचा विध्वंस बुद्धदेवानें केला, असें कांहीं अर्वाचीन पंडित म्हणतात, तेव्हां मला खरोखरच मोठे हंसू येतें. गीर्वाण साहित्यांत स्वतःस प्रवीण म्हणविणाऱ्या या पंडितांनी तरी अधिक विचार करावयास हवा होता. ब्राह्मणी धर्माची उत्पत्ति बुद्धदेवानंतर झाली हे यांस कळावयास हवें होतें.<noinclude></noinclude> g5c8srfo2ud4jkhkxsuzc2zqskgt3d8 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२२४ 104 66789 233163 154877 2026-07-15T06:43:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233163 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते.|२१९ }} {{rule}}</noinclude>हिंदुस्थानांत मूर्तिपूजेचा प्रचार बौद्ध धर्मानंतर झाला. वर्षा दोन वर्षांपूर्वी एका रशियन गृहस्थाने एक पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्यांत ख्रिस्तचरित्र सांगत असतां येशू ख्रिस्त जगन्नाथाच्या देवालयांत ब्राह्मणी धर्म शिकण्याकरितां गेला असल्याचे सांगितले आहे. पण ब्राह्मणी धर्मातील मूर्तिपूजा, आणि स्वतःस श्रेष्ठ समजून इतरांपासून विभक्त राहण्याचा त्यांचा बाणा या गोष्टींनी ख्रिस्ताचें मन कंटाळून बौद्ध लामाकडे तो निघून गेला, असाहि शोध या रशियन ग्रंथकाराने लाविला आहे. हिंदुस्थानाच्या इतिहासाची यत्किंचितहि माहिती ज्याला आहे, त्याला या दंतकथेचा फोलपणा तेव्हांच पटेल. जगन्नाथाचे देवालय बौद्धांचे आहे, ही गोष्ट सर्वविश्रुत आहे. हे प्राचीन देवस्थान आणि त्याबरोबरच कित्येक दुसरीहि बौद्धांपासून हिरावून घेऊन हिंदु धर्मानुयायांनी ती आपली देवस्थाने बनविली. अशाच गोष्टींची पुनरावृत्ति यापुढे आणखीहि कित्येक वेळां होणार आहे. जगन्नाथाच्या देवालयाची हकीकत अशा प्रकारची आहे. ख्रिस्ताच्या काळी तेथे एकहि ब्राह्मण नव्हता. इतिहास अशा प्रकारचा असतां ब्राह्मणी धर्म शिकण्याकरितां येशू ख्रिस्त जगन्नाथास गेला, हा शोध या रशियन पंडिताने कोठून लाविला हे समजणे दुरापास्त आहे. 'सर्वां भूती दया' हे बुद्धदेवाच्या धर्माचें आदितत्त्व आहे. बौद्ध धर्म हा मुख्यत्वेकरून अत्युच्च नीतिप्रवर्तक धर्म आहे. तथापि हा धर्म इतका उच्च असतांहि हिंदुस्थानांतून तो क्रमशः नाहीसा होत गेला; आणि त्याच्या नाशानंतर जें धर्मस्वरूप तेथें शिल्लक राहिलें तें अत्यंत किळसवाणे होते. यांत घाणेरडे प्रकार किती होते, याचे यथातथ्य वर्णन करण्यास आज मला अवकाश नाही, आणि तसे करण्याची माझी इच्छाही नाही. अत्यंत उद्वेगजनक आचार, अत्यंत भयंकर पूजाप्रकार आणि अत्यंत किळसवाणी चोपडी ही या काळी निर्माण झाली. जितक्या घाणेरड्या कल्पना मनुष्याच्या मेंदूत निर्माण होणे शक्य आहे आणि जितके घाणेरडे शब्द मानवी हस्ताने लिहिले जाण्यासारखे आहेत, तितक्या साऱ्या कल्पना या काळी प्रसार पावून तितके घाणेरडे शब्द या काळी लिहिले गेले. क्रूर पशूंना शोभतील असे अत्याचार धर्माच्या वेषाने समाजांत खुशाल वावरू लागले. बौद्ध धर्माचे विकृत रूप अशा प्रकारचे झालें.<br>{{gap}}पण भरतभूमीने अजून जगावें, असा ईश्वरी संकेत होता; आणि याकरितां त्याने पुनः एकवार अवतार घेतला. ''''यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भ-'''<noinclude></noinclude> 53t4zliasnmpkklz3ywymprusrfof7u पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८७ 104 110911 233144 232888 2026-07-14T16:40:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233144 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ११ वें.'''}}}} {{rule|7em}} {{center|'''काशी अथवा बनारस'''}} {{gap}}{{x-larger|'''ता.'''}}२ एप्रिल सन १९३५ रोजी पहाटेस पांच वाजतां प्रो. रानडे यांचा प्रेमपूर्वक निरोप घेऊन मी इ. आय. रेल्वेच्या अलाहाबाद- जानपूर शाखेवरील '''प्रयाग''' स्टेशनवर आलों. स्टेशन लहानसेंच आहे. येथें गाडी सव्वासहा वाजतां आली. ही गाडी न बदलतां थेट बनारस कँटोन्मेट स्टेशनला जाणारी होती. अलाहाबादेहून बनारसेस जाण्यास रेलवेचे कमी ज्यास्त लांब तीन मार्ग आहेत. अलाहाबादेस यमुनेच्या पुलाच्या अलीकडील नैना व चौकी या फाट्यानें जबलपुरकडून कलकत्त्याला जाणाऱ्या मोठ्या इ. आय. रेलवेच्या मार्गानें मोगल सराईस येऊन मग तेथून गंगेचा पूल ओलांडून बनारसला जाणे हा पहिला मार्ग होय. हा अर्थात् सर्वात लांबचा मार्ग आहे. यामध्ये फक्त गंगानदीच्या पुलावरून जावें लागतें. दुसरा रेलवेरस्ता बंगाल नार्थ वेस्ट (B. N. W.) रेलवे कंपनीचा आहे. पण तो मिटर गेज आहे. त्यानें अलाहाबादच्या पूर्वेस असलेल्या गंगेच्या पुलावरून जावें लागतें. या रस्त्यानें बनारस सुमारें ७५ मैल आहे. पण काशीस पोहोंचावयास पांच तास लागतात. तिसरा रेलवे रस्ता इ. आय. रेलवे कंपनीचाच आहे. तो रस्ता अलाहाबादेच्या उत्तरेस असलेल्या गंगा नदीवरील कर्झन पुलावरून जातो व मग '''जंगघाय जंक्शन''' वरून बनारसला जातो. या रस्त्यानें बनारस सुमारें ऐशी ब्यायशी मैल आहे. पण गाडी बनारसला साडेतीन तासांत पोहोंचते. या रस्त्यावरच प्रयाग स्टेशन आहे व म्हणून मी प्रयाग स्टेशनला येऊन गाडीत बसलों. गाडीत गर्दी फारशी नव्हती. गंगेवरील तो लांबच लांब कर्झन पूल पाहून व नदीचें तें अफाट पात्र पाहून मला आश्चर्य वाटलें. पूल टाकला की पांढरट रंगाच्या मातीचा सपाट प्रदेश एक सारखा लागतो. क्षितिजा-<noinclude></noinclude> 7459if9iymsnsr0rdufgu9cwp2j7yyg पान:आमच्या आयुष्यांतील कांहीं आठवणी.pdf/२ 104 110966 233143 2026-07-14T16:18:07Z ~2026-39715-30 6102 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "फांल्फिपयेंप्नस्रारफपंद्दळीचीपुस्तऋपाया. पुस्तक ५२ वे. आमच्या आयुणांतील कांहीं आठवणी. हें पुस्तक श्रीमती रमप्याहॅ रानडे [ द्वितींयाद्दात्ते- ] …शौश्मि मनोरंजक ग्रंथमसारफ म..." 233143 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="103.220.80.46" /></noinclude>फांल्फिपयेंप्नस्रारफपंद्दळीचीपुस्तऋपाया. पुस्तक ५२ वे. आमच्या आयुणांतील कांहीं आठवणी. हें पुस्तक श्रीमती रमप्याहॅ रानडे [ द्वितींयाद्दात्ते- ] …शौश्मि मनोरंजक ग्रंथमसारफ मंडळी, गिंल्गांक् मु'वईं’ किंमत १॰॰-॰. ] [ जून, १९१०,<noinclude></noinclude> mm2giv27jbylmu9yi63u5i02v6l0krk पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८८ 104 110967 233145 2026-07-14T16:49:01Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233145 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>पर्यंत कोठेही टेंकड्या किंवा डोंगर दिसत नाहीं. जिकडे पहावे तिकडे पांदुरकी जमीनच जमीन. इकडलीं मुख्य पिकें गहूं व ऊंस हीं होत. पण एप्रिल पर्यंत हीं दोन्हींही निघून गेल्यामुळे जमीन उघडीच होती. जुन्या चालीच्या हिंदु माणसाच्या भादरलेल्या डोक्यावर लहानशी शेंडी दिसावी त्याप्रमाणें या उघड्या बोडक्या जमिनीवर मधूनमधून उसाच्या मळ्यांतील ताटांचे झुपके दिसत होते. या भागांत कालवे कोठेही दृष्टीस पडले नाहींत. मात्र आंब्याच्या झाडाच्या राई कोठें कोठें दिसल्या. क्वचित् क्वचित् विहीरीवरील बागाईत दिसलें. पण एकंदरीत हा ऐशीब्यैशी मैलाचा प्रांत फारसा नयनमनोहर दिसला नाहीं. पण नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शेतांत पिके उभी असल्यामुळे तो भूमिभाग हल्लींपेक्षां पुष्कळच हिरवा हिरवागार दिसत असला पाहिजे असा मी तर्क केला.<br>{{gap}}जसजशी काशी नजीक येऊ लागली तसतशी यात्रेकरू व त्यांना बरोबर घेऊन येणारे काशीचे पंड्ये यांची गाडींत गर्दी होत चालली व त्यामुळे बाह्य सृष्टीकडून माझे लक्ष अन्तःसृष्टीकडे वळलें. प्रथमतः भाविक व धार्मिक यात्रेकरू व माझ्यासारखे निसर्गप्रिय प्रवासी यात्रेकरू यांच्यामधील विरोध माझ्या मनापुढे उभा राहिला. नुकत्याच घडलेल्या माझ्या प्रयागयात्रेचे मी सिंहावलोकन करूं लागलों. भाविक यात्रेकरूंनी प्रयागास पहावयाच्या यात्रास्थानांची व धार्मिकविधींचीं मला माहिती नव्हती असें नाहीं. {{Block center|<poem>'''त्रिवेणी माधवं सोमं भरद्वाजंच वासुकिम् ।''' '''वन्देऽक्षयवटं शेषं प्रयागं तीर्थनायकम् ॥'''</poem>}} {{gap}}त्रिवेणी, आदि माधव, सोमेश्वर महादेव, भारद्वाज, वासुकी, अक्षयवट व शेषनाग अशीं ही सात मुख्य यात्रास्थाने भाविक यात्रेकरू पाहिल्याखेरीज यात्रा पुरी झाली असें समजत नाहींत; तसेंच गंगा, यमुना व गुप्त सरस्वती या तीन नद्यांच्या संगमस्थानीं मुंडन,<noinclude></noinclude> 1y03m3yf84b29te0tac6mrc4tzd3hfs पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८९ 104 110968 233146 2026-07-14T16:52:52Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233146 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१५३ }}</noinclude>(बायकांचे बाबतीत वेणीदान) स्नान व पिंडदान इतके विधी केल्याखेरीज भाविक यात्रेकरूचें समाधान होत नाहीं! पण माझ्यासारख्या '''सर्वाभूतीं व सर्वास्थानी''' परमेश्वर मानणाऱ्या प्रवासी यात्रेकरूचें समाधान प्रयागांतील अर्वाचीन विद्यापीठ, प्राचीन व अर्वाचीन शिल्पकला स्थानें पाहण्यानें व निसर्गरमणीय अशा गंगायमुनेच्या संगमस्थानीं स्नान करण्यानें झालें व यात्रेचें सर्व श्रेय मला मिळालें असें मला वाटलें. तेव्हां धार्मिक व भाविक यात्रेकरू व सुशिक्षित प्रवासी यात्रेकरू यांच्या मनोघटनेत केवढे अंतर पडलें आहे हें मनांत येऊन मला आश्चर्य वाटलें. {{Block center|<poem>'''काशी काञ्ची च मायाख्यात्वयोध्या द्वारावत्यपि ।''' '''मथुरावन्तिका चैताः सप्तपुर्योऽत्र मोक्षदाः ॥'''</poem>}} {{gap}}काशी, कांची, हरद्वार, अयोध्या, द्वारका, मथुरा व उज्जयनी या प्रख्यात नगरसप्तकांतील पहिल्या नंबरच्या नगरास जात असतांना मी जुन्या गंगातीरावरच्या एखाद्या प्रख्यात घाटावर न जातां प्रथम सहा सात मैल दूर असलेल्या गेल्या वीस वर्षांपूर्वी निघालेल्या हिंदु विश्वविद्यालयाचे ठिकाणी जात होतों. हा नव्या जुन्यांतील फरक माझ्या मनांत येऊन मला आश्चर्य वाटत होतें.<br>{{gap}}अशा आश्चर्यमग्न मनःस्थितींत बनारस कँटोनमेंट स्टेशन केव्हां आलें हें मला कळलें नाहीं. पण लोक भराभर उतरूं लागले व तांबड्या लाल पोशाखाच्या हमालांची प्लॅटफार्मवर गर्दी दिसली, तेव्हां माझें उतरण्याचे स्टेशन आलें असें मला कळलें व मग मी लगबगीनें एका हमालास हाक मारून त्याचे डोक्यावर सामान देऊन डब्यांतून प्लॅटफार्मवर आलों. मी बनारस विश्वविद्यालयामधील औद्योगिक रसायनशास्त्राचे प्रोफेसर गोडबोले यांचेकडे उतरण्यास जाणार होतों. त्यांना आगाऊ पत्र लिहिलें होतें. म्हणून मी त्यांची किंवा त्यांचेकडील माणसाची वाट पहात होतों. इतक्यांत एका महाराष्ट्रीय गृहस्थांनीं मला हटकलें व प्रो.<noinclude></noinclude> c65xruscip1yp0rxg0l52xty45ghock पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९० 104 110969 233147 2026-07-14T16:55:20Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233147 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>गोडबोले यांचे आपण पाहुणे काय असा मराठीत प्रश्न केला. मी होय म्हणतांच ते माझ्या बरोबर स्टेशन बाहेर आले व आम्हीं एका रुपयाला टांगा करून बनारस हिंदू विश्वविद्यालयाकडे चाललों. कँटोनमेंट स्टेशनहून विश्वविद्यालय पांच सहा मैल दूर आहे. काशीच्या दक्षिण दिशेला तें असल्यामुळे आम्हांला अर्धा अधिक गांव ओलांडून जावा लागला. सुमारें एकोणतीस वर्षांपूर्वी मी काशीस आलों होतों त्यापेक्षां हल्लींच्या शहरांत कितीतरी फरक झाला आहे असे मला वाटलें. तो सुंदर सरळ काँक्रीटचा पांढरा शुभ्र रस्ता व रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या त्या फरसबंदी पायवाटा व नाना रंगाच्या मोठमोठ्या इमारती व दुकानें यावरून जातांना मला सानंद आश्चर्य वाटलें. शहराच्या शेवटीं दुर्गादेवीचें देऊळ व दुर्गातलाव लागला. येथला जुना रस्ता सर्वच फरसबंदी होता. मग मात्र नेहेमींचा पांढऱ्या खडीचा पण मधून मधून खड्डे व धूळ असलेला रस्ता लागला. पुढे एक छोटासा नाला लागला व त्याचे आसपास शेतीभाती व बागायती भाग लागला व मग लंका नांवाचें गलिच्छ खेडें लागलें. नांव सोनुबाई हातीं कथलाचा वाळा ही म्हण तें लंका गांव व त्याची स्थिति पाहून माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. हें गलिच्छ व अरुंद रस्त्याचें खेडें टाकल्यावर लागलीच बनारस हिंदु विश्वविद्यालयाचें भव्य व प्रशस्त प्रवेशद्वार आले व विश्वविद्यालयाचे अफाट आवार व त्यामधील मोठमोठ्या इमारती पाहून मी आश्चर्यचकित झालों. प्रथमतः डाव्या हातास मोठें थोरलें इस्पितळ व वैद्यक विद्यालयाच्या इमारती लागल्या तर जरा पुढे गेल्यावर मुलांचीं मोठमोठीं वसतिगृहें लागलीं. हिंदू शिल्पपद्धतीच्या त्या नक्षीदार कमानी, तो इमारतीचा गुलाबी व बदामी रंग, ते इमारतीच्या दोन्हीकडेचे व मध्यावरचे वर्तुळाकार शिखरांसारखे मनोरे हा सर्व देखावा मनुष्याचें मन थक्क करून टाकणारा आहे यांत शंका नाहीं. या वसतिगृहांचे मागच्या बाजूस प्रोफेसर मंडळींचे बंगले आहेत. प्रोफेसर गोडबोले यांचे बंगल्याशी आमचा टांगा थांबला. प्रो. गोडबोले यांनी माझें<noinclude></noinclude> 3gba8dqgoh11aqhvts6wpwnlhw1n9o7 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९१ 104 110970 233148 2026-07-14T16:58:45Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233148 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१५५ }}</noinclude>मनःपूर्वक स्वागत केलें. याप्रमाणे मी काशीस- जुन्या नव्हे तर नव्या- येऊन पोहोंचलों. काशींतील पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळ वर्णनास लागण्यापूर्वी काशीशहराची पूर्वपीठिका, त्याचा सध्यांचा विस्तार व सामान्य स्वरूप याचें दिग्दर्शन करणे इष्ट होईल.<br>{{gap}}हिंदुस्थानांतील सात अत्यंत पुरातन पुरांपैकीं काशीनगरीला आद्य मान दिलेला आहे याचा उल्लेख मांगेंच आला आहे. आर्यलोक पंजाबांतून गंगायमुनेच्या सुपीक प्रांतांत राहण्यास आले तेव्हां काशी शहर वसलें. व कालेकरून तें आर्यविद्यांचें, आर्यसंस्कृतीचें व आर्यधर्माचे आद्य स्थान बनले व म्हणूनच वेदकाळापासून काशी विद्यापीठ म्हणून प्रख्यात झालें व आसेतुहिमालय सर्व हिंदूचे काशी हे अत्यंत पवित्र असें यात्रास्थान बनलें. आज सतत तीन हजार वर्षे या शहरानें अखिल हिंदूंच्या मनोभूमीमध्ये पहिलें स्थान पटकाविलें आहे. यामुळे हिंदुधर्माचे व समाजाचे मोठमोठे सुधारक व पंथसंस्थापक यांना काशी येथें येऊन आपला संदेश किंवा नवमत प्रस्थापित केल्यावांचून गत्यंतर नसे. गयेस पिंपळाच्या वृक्षाखालीं मनन करीत असतांना गौतमबुद्धाला नव्या धर्मतत्त्वाचें दर्शन झालें व त्याला आपल्या नव्या धर्माची घोषणा करण्याकरितां काशीस यावें लागलें. सारनाथ (सध्याच्या काशीच्या उत्तरेस पांच मैलांवरील ठिकाण) येथें बुद्धानें प्रथम आपला धर्मोपदेश केला व आपला संघ स्थापन केला. म्हणूनच गया, काशी व सारनाथ हीं तीन्हीं स्थानें बौद्धधर्मीयांना अत्यंत पवित्र वाटतात व चीन सारख्या दूर दूर देशांहून प्रवाशी बौद्धधर्माच्या पवित्र स्थानाचें दर्शन घेण्याकरितां येत असत व अझून येतात. याप्रमाणें काशी हें हिंदुधर्म व बौद्धधर्म या दोन्ही धर्माचें पवित्र तीर्थयात्रास्थान बनले आहे.<br>{{gap}}बौद्धधर्माचा पाडाव करून हिंदुधर्माचें पुनरुज्जीवन करणारे स्वामी व आचार्य- कुमारिल भट्ट, शंकराचार्य, वल्लभाचार्य हे या प्रख्यात विद्यापीठाला येऊन गेले व तेथेच त्यांनीं आपलीं नवमतें जगजाहीर केली.{{nop}}<noinclude></noinclude> dnthq7jxux9qc0gmrh25cyp6hum22bh पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९२ 104 110971 233149 2026-07-14T17:02:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233149 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}चवदाव्या शतकापासून हिंदुस्थानांत भक्तिपंथ निरनिराळ्या प्रांतांत प्रादुर्भूत झाला. त्या पंथाचे प्रवर्तकही काशीस येऊन गेल्याखेरीज राहिले नाहींत. उत्तर हिंदुस्थानांत उदयास आलेला रामानंद याचे शिक्षणच मुळीं काशीस झालें. "कोणीही कोणाची जातपात किंवा पंथ याची विचारपूस करूं नये; जो जो कोणी परमेश्वराची आराधना करतो तो तो देवाचा आप्त आहे." हा अत्यंत उदार उपदेश रामानुजानें हिंदी भाषेत बहुजनसमाजास केला. कबीर (सन १४४०-१५१८) हा तर काशीस जन्मला व वाढला. "हिंदूंचा हिंदुधर्म मीं पाहिला आहे; व तुर्कांचा तुर्कीधर्मही मी पाहिला आहे; मी अल्ला व राम या दोघांचा आप्त आहे." शीखधर्माचा प्रवर्तक गुरुनानक (सन १४६९ - १५३८) यानें आपल्या शीखधर्माची घोषणा काशीस केली. बंगाल प्रांतांतील भक्तिपंथ प्रस्थापक चैतन्य (सन १४८५ - १५२७) यानें आपला मठ काशीस स्थापन केला. हिंदी रामायणाचा कर्ता तुळशीदास (सन १५३२ - १६२३) हा प्रथम अयोध्येस रहात असे. पण पुढें तो काशीस राहण्यास आला व त्यानें आपलें प्रख्यात रामायण काशींतच रचलें. असीघाटाजवळ तुळशीघाट नांवाचा छोटा व मोडका-तोडका घाट अजून दृष्टीस पडतो. अर्वाचीन काळचे धार्मिक सुधारक व पंथप्रवर्तक हे काशीस येऊन त्यांनीं आपल्या कार्यालयाच्या शाखा काशीस काढल्या आहेत. आर्यसमाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती, रामकृष्ण मिशनचे संस्थापक विवेकानंद व त्यांचे शिष्य, थिऑसॉफिकल सोसायटीच्या प्रमुख प्रवर्तक आनी बिझांट इत्यादि प्रख्यात विभूति या ठिकाणी येऊन त्यांनीं आपल्या नवमताचा उपदेश जनतेस केलेला आहे. याप्रमाणें फार पुरातन काळापासून आजतागाईत काशीशहरानें आपले धर्मविषयक व विद्याविषयक महत्त्व सतत सारखें राखिलें आहे.<br>{{gap}}काशी प्रांताचा व काशी शहराचा राजकीय इतिहास थोडक्यांत सांगण्यासारखा आहे. आर्यांनी गंगेच्या काठच्या प्रांताची वसाहत केली तेव्हांपासून काशीस स्वतंत्र राज्य स्थापन झालें असावें व म्हणून<noinclude></noinclude> 3i1cml2owdo4eze124msw2zt44umzyh पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९३ 104 110972 233150 2026-07-14T17:06:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233150 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१५७ }}</noinclude>'''काशीराज''' असा नामनिर्देश महाभारतांत सांपडतो. पण पुढें काशी प्रांत कोसल साम्राज्यांत सामील झाला असावा असें दिसतें. नंतर कोसल साम्राज्य जाऊन मौर्यांचं साम्राज्य झालें तेव्हां काशी प्रांत त्या साम्राज्यांत सामील झाला. पुढे गुप्तांचें साम्राज्य झालें तेव्हां काशी प्रांत त्या साम्राज्यांत समाविष्ट झाला. सातव्या आठव्या शतकांत हर्षवर्धन हा मोठा चक्रवर्ती राजा झाला. तेव्हां काशी, प्रयाग त्याच्या अमलाखालीं आलीं. हर्षवर्धनाच्या साम्राज्याच्या नाशानंतर उत्तर हिंदुस्थानांत रजपुतांचीं लहान लहान स्वतंत्र राज्ये प्रस्थापित झाली. त्याप्रमाणें काशी प्रांतांत '''गहरवार''' नांवाच्या रजपूत जातीच्या '''बनार''' नांवाच्या राजानें स्वतंत्र राज्य स्थापन केलें. त्यानें गंगा नदी व तिला मिळणारी वारण नदी यांच्या संगमावर राजघाट नांवाचा किल्ला बांधला. या किल्ल्याचे अवशेष असून डफरिन पुलाचे उत्तरेस दृग्गोचर होतात. हा '''बनार''' राजा अकराव्या शतकांतील मुसलमानांच्या स्वारीत मारला गेला. पण काशी प्रांत व काशी शहर हे कुतुबुद्दिन अबेक यानें बाराव्या शतकाचे अखेर काबीज केलें तेव्हां काशींतील हिंदु देवळें पाडण्यांत आलीं व शहराची लूट करण्यांत आली व ती अकबराचे काळापर्यंत मधून मधून चालू राहिली. पण अकबराच्या सहिष्णु व उदार कारभारामुळें काशी शहरास स्वास्थ्य मिळालें व हिंदूराजांनी पुन्हां देवळें बांधलीं. याच काळांत काशीचें प्रख्यात मानमंदिर, मानमंदिरघाट व वेधशाळा हीं बांधण्यांत आली. शहराची ही सुस्थिति औरंगझेबाचे कारकीर्दीपर्यंत चालली. औरंगझेबाचा भाऊ दारासुख जो संस्कृत भाषेचा व संस्कृतांतील उपनिषद् तत्त्वज्ञानाचा मोठा चहाता होता तो काशीस राहिला होता. तसेंच शिवाजी औरंगझेबाचे कैदेतून सुटल्यावर सन १६६६ मध्ये काशींत कांहीं काळ राहिला होता. आपल्या दोन कट्ट्या दुष्मानांना काशी शहरानें आश्रय दिला म्हणून औरंगझेबाची या शहरावर करडी व खुनशी नजर फिरली व सन १६६९ मध्ये औरंग-<noinclude></noinclude> kaw8qu5v33y6qh6q2wh36sd1y7wsz4j पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९४ 104 110973 233151 2026-07-14T17:08:54Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233151 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>झेबानें काशी शहरांतील पवित्र व प्रख्यात विश्वनाथाचें देवालय पाडलें व त्याचे जोत्यावर एक मशीद बांधली. तसेंच बिंदुमाधव नांवाचे विष्णूचे देवालय पाडून त्या जागेवर एक फारच मोठी मशीद बांधली. त्या मशीदीचे दोन उंच उंच मनोरे असून प्रत्येक हिंदु यात्रेकरूला औरंगझेबाच्या हिंदूधर्मछलाची साक्ष देतात व हिंदूंच्या दुर्बलतेबद्दल लाज वाटावयास लावतात. आणखीही पुष्कळ देवळांचा नाश औरंगझेबाने आपल्या कारकीर्दीमध्यें केला. त्यांची मोजदाद कोण करणार? काशी शहरांतील देवळांचा नुसता नायनाट करूनही औरंगझेबाचें समाधान झालें नाहीं. त्यानें शहराचे नांवही बदलण्याचा प्रयत्न केला व काशी शहराचे '''महमदाबाद''' असे नवें नामाभिकरण सुद्धां केलें. जड दगडमातीची देवळे जमीनदोस्त करणे सोपें आहे. पण बहुजन समाजाला प्रिय व पवित्र नांव नाहींसें करणें सत्ताधीशाला सुद्धां शक्य नाहीं हें औरंगझेबाच्या कृतीवरून दिसून आलें.<br>{{gap}}औरंगझेबाच्या मृत्यूनंतर काशी शहराचा छल मंदावला व पुढें काशी प्रांत व काशी शहर अयोध्येच्या नवाबाच्या ताब्यांत गेलें. त्यानें या प्रांताचा कारभार रस्तमअली नांवाच्या अंमलदारावर सोपविला. हा रस्तमअली मनसाराम नांवाच्या प्रख्यात जमीनदारावर सर्वस्वी अवलंबून होता व म्हणून प्रत्यक्ष कारभार मनसारामच पाही. रस्तमअलीच्या पश्चात् मनसाराम हाच काशी प्रांताचा अधिपती बनला. मनसाराम याचा मुलगा बलवंतसिंग याला दिल्लीच्या बादशहानें राजा हा किताब बहाल केला. सन १७४८ मध्ये बलवंतसिंगाने काशीचा स्वतंत्र राजा म्हणून आपल्या नांवाची ग्वाही फिरविली. या बलवंतसिंगाचा मुलगा राजा चेतसिंग यानें वॉरन हेस्टिंगचे कारकीर्दीमध्ये बंड केलें.<br>{{gap}}याप्रमाणें काशी शहराची पूर्वपीठिका आहे. आतां त्याच्या सद्यःस्थितीकडे व विस्ताराकडे नजर फेकूं या.{{nop}}<noinclude></noinclude> 0kywcd5kfbb70jx0kbh15r4obadbihk पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९५ 104 110974 233152 2026-07-14T17:13:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233152 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१५९ }}</noinclude>{{gap}}काशी शहर पुरातन कालापासून दोन नांवांनीं प्रख्यात आहे. एक नांव गुणवाचक आहे तर दुसरे नांव विस्तारवाचक आहे. काशी शब्दाचा वाच्यार्थ '''चकाकणारें''' किंवा '''प्रकाशणारें''' असा आहे. हें नांव अगदीं अन्वर्थक आहे. हिंदुसंस्कृतीचा व हिंदुधर्माचा सर्वत्र प्रकाश पाडणारा ज्ञानदीप असा काशीचा लौकिक आहे व पुरातन काळापासून आजतागाईत हा लौकिक काशी शहरानें कायम ठेविला आहे यांत शंका नाहीं.<br>{{gap}}काशी शहराचें दुसरें नांव '''वाराणशी''' असें आहे. '''बनारस''' हे वाराणशी नांवाचें अपभ्रष्ट रूप आहे. वाराणशी हें नांव विस्तार वाचक असून तें काशी शहराचा सध्याचा विस्तार दाखवितें. प्रयागला गंगायमुनेचा संगम झाल्यावर ही संगत गंगानदी पूर्व दिशेनें वहात काशीकडे येत्ये. मात्र काशीनजीक आल्यावर ती धनुष्याकृति किंवा चन्द्रकोरी मोठे थोरले वाकण करून ईशान्यवाहिनी होते व काशी शहर टाकल्यावर मग पुन्हां पूर्ववाहिनी होते. या धनुष्याकार गंगेच्या प्रचंड वाकणाच्या उत्तर टोकास '''वारणानदी''' पश्चिमेकडून येऊन वेडीवाकडी वळणे घेऊन गंगेस येऊन मिळते व दक्षिण टोकांस '''आसी''' नदी तशीच गंगेला मिळते. '''वारणा''' व '''आसी''' या दोन नद्यांच्या संगमामधील गंगेच्या उत्तर किनाऱ्यावर काशी शहर वसलेलें आहे. म्हणून काशीचें '''वाराणशी''' असें विस्तारवाचक अन्वर्थक नांव पडलें. असो.<br>{{gap}}या दोन संगमामध्ये सुमारें चार मैल अंतर आहे. व सध्यांचे काशी शहर दक्षिणोत्तर असें चार मैल पसरलेलें आहे; तर पूर्वपश्चिम शहराचा सरासरी तितकाच रुंदीचा विस्तार आहे. वारणा नदीच्या उत्तरेस तीनचार मैलांचे अंतरावर पुरातन काळचें बौद्धांचे प्रख्यात ठिकाण '''सारनाथ''' आहे तर आशी नदीच्या दक्षिणेस अर्वाचीन बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे ठिकाण आहे. हिंदुस्थानांतील इतर<noinclude></noinclude> 5zqamdh7upchv979wwm1o5s89808mdx सदस्य चर्चा:Shrikrishna Diwakarrao Dabhadkar 3 110975 233153 2026-07-14T18:53:38Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 233153 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Shrikrishna Diwakarrao Dabhadkar}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ००:२३, १५ जुलै २०२६ (IST) mvllpn28z7b3222pz1pi51tabyop3k0 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९६ 104 110976 233169 2026-07-15T11:18:33Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233169 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>इतिहासप्रसिद्ध शहरांच्या प्रमाणें सध्यां काशीचे दोन मुख्य भाग आहेत; पहिला काशी '''शहर''' व दुसरा काशी '''कँटोनमेंट'''. काशी शहर हें चन्द्रकोरी गंगेचे कांठावर वसलेले आहे. शहराचे पश्चिमेस कँटोनमेंट आहे. शहर व कँटोनमेंट यांचे दरम्यान मुख्य रेल्वेरस्ता गेला आहे. हा रेल्वेरस्ता शहर व कँटोनमेंट यांची मर्यादा बनला आहे. प्रयागकडून रेल्वेने आले म्हणजे शहराच्या प्रारंभीच काशी कँटोनमेंट स्टेशन लागतें. या स्टेशनच्या उजव्या हातास काशी शहर व डाव्या हातास कँटोनमेंट आहे. या रेलवेवरील दुसरें स्टेशन काशी स्टेशन म्हणून आहे. हें गंगेवरील डफरिन पुलानजीक व काशी शहराच्या उत्तर टोकास आहे. काशी कँटोनमेंटमध्यें, सर्व सरकारी कचेऱ्या व बंगले आहेत; तसेंच युरोपीयन व इंडियन शिपायांच्या बराकी व सदरबझार आहे. नेहेमींप्रमाणे कँटोनमेंट हा सर्व भाग साधारण कमी दाटवस्तीचा; जास्त स्वच्छतेचा, जास्त हवाशीर व जास्त आरोग्यवर्धक असा आहे. येथले ते निर्धूळ डामरी रस्ते, सुरेख पायवाटा, त्याला लागून असलेलीं मोठमोठीं दुकानें व प्रशस्त बंगले मनावर मोठा अनुकूल ग्रह उत्पन्न करतात. पण या नव्या वस्तीमध्ये इतिहासप्रसिद्ध किंवा शिल्पकलानिदर्शक अशीं प्रेक्षणीय स्थळें नाहींतच. तेव्हां मी या भागांत एकदां फेरफटका करून आलों व त्यानेंच माझें कँटोनमेंटचें दृश्यदर्शन संपलें.<br>{{gap}}सारनाथ मी एके दिवशीं टांग्यानें जाऊन पाहिलें. पण सारनाथ व गया या दोन बौद्धधर्मी प्रख्यात व पवित्र स्थानांचें वर्णन एकत्र करणें योग्य आहे. म्हणून ते पुढील प्रकरणांत करण्याचा बेत आहे. तेव्हां राहतां राहिलें काशी शहर व बनारस हिंदु विश्वविद्यालय यांचे वर्णन. मी हिंदु विश्वविद्यालयांत प्रो. गोडबोले यांचेकडे प्रथम उतरलों होतों व माझ्या काशीनिवासाच्या अर्धआठवड्याच्या शेवटच्या दिवशीं काशीमध्यें भाऊराव दामले यांचेकडे राहण्यास गेलों होतों. तेव्हां आतां त्या क्रमानेंच वर्णन देणे सोयीचें आहे.{{nop}}<noinclude></noinclude> 81tvkle9cjv0so9mfnb6zeb1gq1zkdr पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९७ 104 110977 233170 2026-07-15T11:20:51Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233170 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१६१ }}</noinclude>{{gap}}प्रकरणाच्या प्रारंभीं सांगितल्याप्रमाणें मी प्रो. गोडबोले यांचे बंगल्यावर तारीख २ एप्रिल सन १९३५ रोजी दिवसा साडेदहा वाजतां पोहोंचलों. व ता. ८ रोजी पहांटेस मी काशी सोडली. मध्ये दोन दिवस सारनाथ व गया पाहण्यांत गेले. बाकीच्या वेळांत मी काशीचें दृश्यदर्शन संपविलें.<br>{{gap}}बनारस हिंदू विश्वविद्यालयाचीं कॉलेजें बंद होऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू होत्या. यामुळे शिक्षण चालू असतांना वर्ग पाहण्यास मिळाले नाहींत. तरी पण या विश्वविद्यालयाचा विलक्षण विस्तार व अवाढव्य व्याप पहावयास मिळाला व विश्वविद्यालयांतील शिक्षकमंडळीचा परिचय होण्याची दोनदां संधि मिळाली. यांतच मी समाधान मानून घेतलें. माझ्या सुदैवाने मी काशीस पोहोंचलों त्या दिवशीं बनारस विश्वविद्यालयाचे इतिहासाचे प्रोफेसर पुणतांबेकर यांनीं प्रोफेसर मंडळींना सायंकाळी बागेत चहापार्टी दिली होती. मला आमंत्रण असल्यामुळें प्रो. गोडबोल्यांबरोबर मी पार्टीला गेलों होतों. त्या पार्टीला शंभराच्यावर मंडळी जमली होती. येवढा मोठा शिक्षकसमूह हिंदुस्थानांतील कोणत्याही मोठ्या शिक्षणसंस्थेत नाहीं हें खास. या शिक्षकमंडळीमध्यें बहुतेक सर्व प्रांतांतील लोक आहेत असे दिसले. त्यामध्ये आठदहा दक्षिणी गृहस्थ व त्यांपैकीं कांहींजण तर डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधील शिक्षणसंस्थांमध्ये शिकलेले भेटले. यामुळे मला विशेषच आनंद व अभिमान वाटला. अशा मोठ्या घोळक्यामध्ये फारशा ओळखी होऊं शकत नाहीं. तरी पण निरनिराळ्या विषयांच्या प्रोफेसरांशीं माझा परिचय करून देण्यांत आला. दुसरे दिवशीं प्रो. ध्रुव आर्टस-कॉलेजचे प्रिंसिपॉल व व्हाईस चॅन्सेलर यांचेकडे मला चहाला बोलाविलें होतें. तेथें आठदहाच निवडक प्रोफेसर मंडळी होती. यामुळे तेथें त्या मंडळींशीं जास्त परिचय झाला व थोडेंफार संभाषणही झालें. आतां विश्वविद्यालयाच्या दृश्यभागाकडे वळणें बरें.{{nop}}<noinclude><br>{{gap}}११</noinclude> 6x2futhhyqbz60249uqai609fri19yc पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९८ 104 110978 233171 2026-07-15T11:24:05Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233171 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}बनारस हिंदुविश्वविद्यालयाच्या कल्पनेस व योजनेस सन १९०५ मध्यें सुरवात झाली असली तरी हिंदुविश्वविद्यालयाचा स्वतंत्र कायदा सन १९१५ मध्ये पसार झाला व हल्लींच्या जागेवर इमारतीच्या पायाचा दगड बसविण्याचा समारंभ लॉर्ड हार्डिंग यांचे हस्ते ४ फेब्रुवारी सन १९१६ रोजी झाला. म्हणजे आजतागाईत विश्वविद्यालयाचे काम सुरू झाल्याला बरोबर वीस वर्षे झाली. पण या वीस वर्षांमध्ये विश्वविद्यालयाचा केवढा विलक्षण व्याप व विस्तार वाढला आहे!<br>{{gap}}बनारस हिंदुविश्वविद्यालयाचे आवार सुमारें १३०० एकर आहे. येथें नवेंच विश्वविद्यालयनगर रचण्यांत आले आहे. या आवारांत वीस मैल लांबीचे रस्ते केले आहेत! व वीस हजार वृक्ष लावले आहेत! नगररचनेची योजना ही चतुराईची आहे. आवाराचे मध्यभागी सरस्वतीच्या मंदिराची जागा राखिली आहे व या मध्यबिंदूच्या सभोंवार वर्तुळाकार जागा आखल्या आहेत. त्यामध्यें निरनिराळ्या कॉलेजच्या इमारती, प्रयोगशाळांच्या इमारती, विद्यार्थ्यांच्या वसतीगृहांच्या इमारती, विद्यार्थ्यांच्या खेळावयाच्या जागा व शिक्षक मंडळींचे राहण्याचे बंगले अशा क्रमानें सर्व नगर वर्तुळाकार वसविलें आहे व त्यांचे सभोवार वर्तुळाकार रस्ते केले आहेत! किती आश्चर्यकारक, आल्हादकारक व आरोग्यवर्धक ही नगररचना आहे! आवाराचे प्रारंभइ सरळ रस्ता आहे. त्याचे डाव्या बाजूस आयुर्वेदिक कॉलेज व आजाऱ्यांकरितां शंभर रोगी राहण्याची सोय असलेलें रुग्णालय व दवाखाना आहे. शहरांतील लोकांस त्यांतल्या त्यांत जवळ पडावें म्हणून येवढ्या इमारती आवाराचे प्रारंभी शहराच्या बाजूच्या टोकाला बांधल्या आहेत. व्हाईस चॅसेलर मदनमोहन मालवीय यांचा बंगलाही याच कारणाकरितां प्रारंभींच आवाराचे उजव्या बाजूस बांधण्यांत आला आहे.<br>{{gap}}हिंदुविश्वविद्यालयामध्ये सध्यां २६०० विद्यार्थी निरनिराळ्या शाखांमध्ये शिकत आहेत! व १५०० विद्यार्थ्यांना पुरेशीं वसतिगृहें<noinclude></noinclude> o80ppmqzmn6xooro7hh7osqdq7gighc पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९९ 104 110979 233172 2026-07-15T11:26:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233172 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१६३ }}</noinclude>बांधण्यांत आली आहेत. अधिक वसतिगृहांची गरज तीव्रपणे भासत आहे!<br>{{gap}}प्रो. गोडबोले यांनी मला विश्वविद्यालयाचीं निरनिराळीं कॉलेजें- प्रयोगालयें व विद्यार्थ्यांचीं वसतिगृहें दाखविलीं. केवढाल्या त्या भव्य व प्रचंड इमारती! मात्र त्या एकजात हिंदुशिल्पकलापद्धतीच्या बांधण्यांत आल्या आहेत. येथें इमारतींची खेचाखेच झालेली मुळींच दिसत नाहीं. निरनिराळ्या इमारतींसभोंवार खूब खुली जागा सोडली आहे व सर्व रस्ते सुंदर वृक्षराजींनीं अलंकृत केलेले आहेत. यामुळे विश्वविद्यालयाचें सर्व आवार म्हणजे एक प्रचंड व अवाढव्य पार्कच आहे असा भास होतो! हिंदुविश्वविद्यालयाच्या ग्रंथसंग्रहालयाकरितां व विद्यार्थ्यांना तेथल्या तेथें वाचनाची सोय करण्याकरितां एक नवीच भव्य व सुंदर इमारत बांधण्याचे काम चालू होतें. या इमारतीकरितां तीन लाख रुपये बडोद्याच्या महाराजानी दिले आहेत असें कळलें. ही इमारत विलायतेंतील ब्रिटिश म्युझियम व पॅरीसमधील विवलिओथिका या इमारतींच्याप्रमाणे आहे. येथें लाखों ग्रंथ ठेवण्याची सोय केलेली आहे व चारपांचशे विद्यार्थ्यांना एकदम व एकत्र वाचतां येईल येवढा मोठा वाचनालय- दिवाणखाना बांधण्यांत आला आहे! हिंदुविश्वविद्यालयाच्या इमारतींचे व उपकरणांचे सविस्तर वर्णन देणें अशक्य आहे. या विश्वविद्यालयाच्या व्यापाची व विस्ताराची कल्पना ते प्रत्यक्ष पाहिल्यावांचून येणें शक्य नाहीं.<br>{{gap}}हिंदुस्थानांतील इतर विश्वविद्यालयांपेक्षां या विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमांतील विशेष खालील होत असें त्यांच्या अभ्यासक्रमावरून मला दिसून आलें. धर्मशास्त्र, हिंदुधर्मशास्त्र व षडदर्शनें यांचा येथें स्वतंत्र अभ्यासक्रम आहे व त्याबद्दल स्वतंत्र पदवी आहे; हा येथला पहिला विशेष. खनिज धातुशास्त्र (metallurgy) व खाणीचे शास्त्र (mining) या शास्त्रांचा सप्रयोग अभ्यास हा येथला दुसरा विशेष.<noinclude></noinclude> kgqkgba6bq42t0jy7mod6hj6moidj9z पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०० 104 110980 233173 2026-07-15T11:29:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233173 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>औद्योगिक रसायनशास्त्राचा अभ्यास व रासायनिक धंद्यांचे शिक्षण हा येथला तिसरा विशेष. आयुर्वेद व अर्वाचीन शस्त्रक्रियाशास्त्र यांचा अभ्यास हा येथला चवथा विशेष संगीतशास्त्रकलांचा अभ्यास व प्रत्यक्ष ज्ञान हा येथला पांचवा विशेष व लष्करी व शारीरिक शिक्षण हा येथला साहावा विशेष होय.<br>{{gap}}हिंदुविश्वविद्यालयाने सुरू केलेले हे नवे अभ्यासक्रम व ते शिकविण्याची केलेली तजवीज या गोष्टी हिंदुस्थानच्या सद्यःस्थितीमध्ये केवळ उदार संस्कृतिविषयक शिक्षणापेक्षां जास्त उपयुक्त आहेत ही गोष्ट निर्विवाद आहे व या विशेषामुळे हे विश्वविद्यालय आसेतुहिमालयापासून विद्यार्थी आकर्षित आहे. या विश्वविद्यालयाला हिंदुस्थानच्या सर्व राजेरजवाड्यांची व धनिक लोकांची सक्रिय सहानुभूति मिळत आहे. विश्वविद्यालयाचा विलक्षण विस्तार अवलोकन करून ज्याप्रमाणे फार आश्चर्य वाटतें त्याप्रमाणें या विश्वविद्यालयाला मिळालेल्या आर्थिक मदतीची व देणग्यांची प्रचंड रक्कम पाहून तसेंच आश्चर्य वाटतें. गेल्या वीस वर्षामध्यें हिंदुविश्वविद्यालयाला एकंदर सवाकोट रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. यांपैकीं एक कोटीची मदत पन्नास हजार पासून पांच लाख अशा रकमांनी एकंदर छपन्न राजेरजवाडे व लक्षाधीश व्यापारी यांनी मिळून केली आहे!<br>{{gap}}येवढी कल्पनातीत मदत मिळविण्याचें श्रेय पंडित मदनमोहन मालवीय यांना आहे. यामुळेंच विश्वविद्यालयांतील विद्यार्थीसमूह व शिक्षक मंडळ या दोघांमध्यें पंडितजीबद्दल सारखी आदरबुद्धि व पूज्यभाव आहे असें माझ्या पदोपदी दृष्टोत्पत्तीस येत होतें. अशा थोर विभूतीचे दर्शन घेण्याची मला फार उत्कट इच्छा होती. म्हणून आम्हीं त्यांचे बंगल्यावर गेलों होतों. पण पंडितजीची प्रकृति बरी नाहीं असें कळल्यामुळे मी आपली उत्कट इच्छा मनांतल्या मनांत दाबून टाकली.<br>{{gap}}हिंदुविश्वविद्यालयाला येवढ्या प्रचंड प्रमाणावर आर्थिक मदत झाली आहे तरी या विद्यालयाच्या वाढीचा व विस्ताराचा आणखी विचार<noinclude></noinclude> cazhb1eb4ntzyox7msamqju63mmcv8f पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०१ 104 110981 233174 2026-07-15T11:31:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233174 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१६५ }}</noinclude>चालूच आहे व पंडितजीनीं आणखी एक कोट रुपयांची मदत मिळविण्याकरितां विनंतिपत्रकाच्या रूपाने आपला हात पसरला आहे असें मला दिसलें! पंडितजीच्या पश्चात् या विश्वविद्यालयाचा भार कोण घेणार अशा प्रकारचे उद्गार मला माझ्या काशीच्या मुक्कामांत वारंवार ऐकू आले. तेव्हां पुढचें कांहीं होवो, पंडितजींना परमेश्वरानें आणखी अधिक आयुष्य द्यावे अशी मी परमेश्वराची मनोमय प्रार्थना केली. असो.<br>{{gap}}माझ्या काशीच्या मुक्कामामध्यें मी प्रो. नारळीकर गणीतशास्त्राचे तरुण प्रोफेसर, प्रो. आडारकर अर्थशास्त्राचे नवे प्रोफेसर व प्रो. जोशी पदार्थशास्त्राचे प्रोफेसर या दक्षिणी मंडळींच्या बंगल्यावर मुद्दाम भेटावयास गेलो होतों. प्रो. नारळीकरांचे बंगल्यावरच मला नामदार खापर्ड्यांचे चिरंजीव व हिंदुविश्वविद्यालयांतील मराठीचे प्रोफेसर खापर्डे भेटले. माझ्या काशीनिवासाच्या शेवटच्या दिवशीं प्रो. गोडबोल्यांचा निरोप घेऊन मी भाऊराव दामले (काशीमधील एक बहुश्रुत व व्यवहारज्ञ उपाध्याय) यांचे गंगातीरावरील बिऱ्हाडीं राहण्यास आलों. तेव्हां आतां जुन्या काशीच्या वर्णनास लागणें बरें.<br>{{gap}}मी प्रथमतः काशी शहर सन १९०६ सालीं पाहिलें होतें. त्यावेळीं तें शहर फार घाणेरडे व बारिक बारिक बोळांचें आहे असें मला वाटलें होतें. पण या खेपेला मी दोनदां चालत शहरांतून जाऊन आलों व दोनदां नदीमधून होडीने शहराची व घाटांची शोभा पहात हिंडून आलों. या गेल्या तीस वर्षांमध्ये शहराच्या स्वच्छतेंत पुष्कळ सुधारणा झाली आहे असें माझ्या नजरेस आलें व त्याची चवकशी करतांना असें कळलें कीं, कांहीं वर्षांपूर्वी काशीची म्युनिसिपालिटी अव्यवस्थित च अफरातफरीच्या कारभाराबद्दल सस्पेंड करण्यांत आली होती. शहराच्या सुदैवानें तिला चांगला कर्तव्यदक्ष, कर्तबगार व सर्वा-<noinclude></noinclude> 7jve65eiwhvqdhny91eb8h3vjqa8wmy पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०२ 104 110982 233175 2026-07-15T11:33:48Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233175 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>धिकारी असा कारभारी मिळाला व त्यानें पांचसात लाख रुपये खर्च करून शहराचे मुख्य मुख्य रस्ते निर्धूळ डामरी व काँक्रीटचे करून टाकले; जेथें रस्ते व बोळ रुंदावणें शक्य झालें तेथे रस्ते व बोळ रुंदावले व मोडकी तोडकी फरशी काढून तेथें नवी चांगली फरसबंदी करण्यांत आली. यामुळे शहराचे स्वरूप व स्थिति पुष्कळ सुधारली. शहरांत हिंडतांना हा फरक माझ्या पदोपदीं लक्षांत येत होता. अलीकडे सन १९२६ मध्यें दुसरी एक चांगली गोष्ट घडून आली; ती म्हणजे '''काशी घाट-सुधारणा-मंडळाची''' स्थापना ही होय. शहरांतील वजनदार व ऐपतदार असे मोठमोठे लोक या मंडळाचे सभासद व व्यवस्थापक आहेत.<br>{{gap}}काशीमधील जगप्रसिद्ध सुंदर सुंदर घाट यांची दुरुस्ती व सुधारणा करणें व शहरांतील सांडपाणी घाटावर व नदीमध्ये न येईल अशी व्यवस्था करणें अशा जोड उद्देशानें हें मंडळ स्थापन करण्यांत आलें आहे. या मंडळानें 'बनारस व तेथले घाट' या नांवाचें सुंदर व सचित्र पुस्तक प्रसिद्ध केलें आहे. काशीस जाणाऱ्या व इंग्रजी जाणणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूनें हे पुस्तक अवश्य संग्रही ठेवण्यासारखें आहे.<br>{{gap}}काशीमधील प्रेक्षणीय स्थळे म्हणजे तेथली धनुष्याकार गंगानदी, तीवरील घाट व देवळें हींच होत. मथुरा वृंदावनाच्याप्रमाणें काशीमध्यें लहानमोठीं चारपांच हजार तरी देवळें आहेत. पण त्यांपैकीं मुख्य व पवित्र अशीं फार थोडकींच आहेत. सर्वसाधारण प्रवासी व यात्रेकरू तेवढींच पहातात व आपली काशीयात्रा पुरी करतात. यांमध्यें पंचतीर्थ यात्रा हीच सुलभ व सहज होणारी आहे. कारण ती एका दिवसांत आटपते. पंचक्रोशीयात्रा करण्यास एक आठवडा तरी लागतो व त्यामध्यें एकंदर पंचवीसतीस मैलांचा पायी प्रवास करावा लागतो; तेव्हांच पुष्कळ पुण्य पदरी पडतें! मी या रूढ व धोपटमार्गी दोन्हीही यात्रा केल्या नाहींत खऱ्या; तरी पण अर्वाचीन तऱ्हेनें माझी यात्रा झाली व माझ्या यात्रेचें आनंदरूपी पुण्य मला तात्काळ मिळालें. असो.{{nop}}<noinclude></noinclude> 9ygc8lcll8ogji3duujwsxjym4u9bpz पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०५ 104 110983 233176 2026-07-15T11:38:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233176 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१६७ }}</noinclude>{{gap}}ता. ६ प्रपिल सन १९३५ शनवार रोजी आम्हीं सकाळीच प्रो. गोडबोले यांचे बंगल्याहून निघालों व झटक्यांत बसून दुर्गादेवीचे देवालय व दुर्गातलाव (काशी शहराच्या दक्षिण टोकाला असलेले प्रेक्षणीय स्थळ) येथे येऊन उतरलों. हा चौकोनी तलाव तांबड्या दगडांनी बांधलेला असून त्याला चौबाजूंनी पाण्यापर्यंत पायऱ्या केलेल्या आहेत. तलावाचे कांठावर दुर्गेचें दगडी देवालय आहे. येथला रस्ता फरसबंदी आहे. काशीमधील हे हिंदुविश्वविद्यालयाकडून येतांना दिसणारे पहिलेच प्रेक्षणीय स्थळ होय व त्याचा मनावर अनुकूल परिणाम होतो यांत शंका नाहीं. येथून आम्ही एका उजव्या हाताच्या बोळानें नदीकाठीं चालत आलों तों आसी संगमाशीं आलों. येथे गंगा नदी व आसी नदी यांचा संगम झाला आहे! राक्षस व खुजा किंवा पर्वत व उंदीर या कल्पित गोष्टीमधल्या भेटी सारखाच हा संगम वाटतो! केवढी अवाढव्य व अफाट ती गंगानदी व नाल्या येवढी चिमुकली व चिंचोळी ती आसी नदी! पण हा मानलेला संगम हें पंच तीर्थांपैकी पहिले तीर्थ होय. काशीच्या दगडी घाटांस येथूनच सुरवात होते व हे घाट सारखे तीन मैलपर्यंत पसरलेले आहेत! येथें पुष्कळ होड्या भाड्याने मिळतात. आम्हीं दशाश्वमेध घाटाशी उतरण्याचे ठरवून होडीत बसलों. भाडें चारसहा आण्यांच्या वर पडत नाहीं. होडीमधून जातांना घाटांची व देवळांची दुरुनची शोभा सहज दृष्टीस पडते. होडींत बसल्याबरोबर पहिला घाट लागतो तो हिंदी रामायणाचा कर्ता तुळसीदास याच्या नांवाचा आहे. हा घाट फारच साध्या बांधणीचा आहे व पुष्कळ मोडकळीस आलेला दिसला. हा घाट टाकला की, लागलीच काशी म्युनिसिपालिटीच्या पाणीपुरवठ्याचें पंपिंगस्टेशन लागते. येथेंच शहराकडून नदीच्या किनाऱ्यापर्यंत गाडीरस्ता आला आहे. येथेच गंगेच्या पलीकडील तीराकडून दगडी फरशा व इमारती दगड होड्यांनीं येतो त्याचा सांठा येथेंच आहे. नंतर घाटामागून घाट असे सारखे घाट लागतात. त्या घाटांची,<noinclude></noinclude> p45bieksotc261orawfd5l2y31f2tum पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०६ 104 110984 233177 2026-07-15T11:41:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233177 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>घाटावरील तटांची, त्यावरील देवळांची व धर्मशाळांची निरनिराळ्या बांधकलापद्धतीची विविध बांधणी याचें विलक्षण नवल वाटते. येथें तत्त्वज्ञान्याच्या unity in diversity (विविधतेमध्यें ऐक्यता) या आवडत्या तत्त्वाचें मूर्तिमंत चित्र दृग्गोचर होतें. नंतर फार पुरातनकाळच्या करुणरसप्रधान कथेची आठवण करून देणारा हरिश्चन्द्र घाट लागतो. येथें पूर्वी प्रेतें जाळीत असत. याच स्मशानाचे डोंब मालकाची चाकरी हरिश्चन्द्र राजानें धरली होती व याच ठिकाणी आपल्या रोहिदास मुलाच्या प्रेताबद्दलच्या फीची आपल्या निष्कांचन तारामती राणीजवळ, हृदयद्रावक मागणी करण्याची पाळी हरिश्चंद्रावर आली व तो सत्वशील राजा या दिव्यांतून पार पडल्यामुळे रोहिदास जीवंत होऊन ही करुणरस कहाणी शेवटीं आनंदपर्यवसाथी झाली!<br>{{gap}}हरिश्चन्द्र घाट हा आसीघाटापासून सतरावा घाट आहे. पुढे एकावर एक कडी असे मोठमोठे घाट लागतात. इंदूरची प्रख्यात राणी अहिल्याबाई इचा घाट फार सुबक असून तो अझून उत्तम स्थितींत आहे. हा घाट टाकून जरा पुढे जातों तोंच दशाश्वमेध घाट लागला. आम्ही होडीवाल्याचे भाडें चुकतें करून घाटाच्या पायऱ्यावर उतरलो. हा घाट धनुष्याकार गंगाप्रवाहाच्या मधोमध असून या घाटाशींच शहरांतून येणारा मुख्य रस्ता आहे. येथें काशीच्या देवदास नांवाच्या राजानें दहा घोड्यांचा मोठा यज्ञ केला म्हणून या घाटाला दशाश्वमेघ घाट म्हणतात अशी दंतकथा आहे. काशीच्या पंचतीर्थांपैकी हे दुसरें तीर्थ होय. प्रत्येक भाविक यात्रेकरू या घाटावर स्नान केल्याखेरीज व येथल्या महादेवाचें दर्शन घेतल्याखेरीज रहात नाहीं. आम्ही घाटाच्या पायऱ्या चढून वर आलो व मग बारक्या बोळाबोळानें दाट वस्तीच्या भागांतील पुण्याच्या प्रख्यात तिळवणकर घराण्याच्या खासगी रामाच्या देवळाशीं आलों. तिळवणकरांचे काशीमध्यें पोथ्या पुस्तकांचें पुष्कळ दिवसांचें दुकान असून त्यांच्या<noinclude></noinclude> ocb1qd4oc7iw8fr1f0qfam9gvofe6jx पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२०९ 104 110985 233178 2026-07-15T11:44:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233178 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१६९ }}</noinclude>पूर्वजांनी तें रामाचें देऊळ बांधलें. छोटेसें रामाचें देऊळ प्रेक्षणीय आहे. प्रो. गोडबोल्यांनीं रा. तिळवणकराशीं माझा परिचय करून दिला. माझें बरेंच आयुष्य पुण्यांत गेलें असल्यामुळे पुण्यांतील एका पिढीजाद घराण्यांतील गृहस्थ परप्रांतांत स्थाईक होऊन सुस्थितींत आहेत हे पाहून मला आनंद वाटला. नंतर आम्हीं मनकर्णिका घाटावर आलो. पंचतीर्थापैकीं हें तिसरें तीर्थ होय. हा घाट फारच प्रशस्त व प्रेक्षणीय आहे व तो अजून चांगल्या स्थितीत आहे. या घाटा शेजारींच हल्लींचीं प्रेत जाळण्याची जागा आहे. आम्ही काशीविश्वेश्वराचें दर्शन घेतलें. किती लहान तें देऊळ आहे! बायकापुरुषांची सारखी ये-जा सुरू होती! प्रदक्षिणा मार्ग जरी उत्तम फरसबंदी आहे तरी तेथे देवळाच्या आवारांतील वृक्षांची पानें पडून व त्यावर यात्रेकरूंच्या भांड्यांतील अभिषेकाचें पाणी सांडून सर्व प्रदक्षिणामार्ग ओला व पाचोळ्यांनी भरलेला पाहून काशीविश्वेश्वराच्या देवालयाच्या व्यवस्थेबद्दल माझा प्रतिकूल ग्रह झाला. या देवळाच्या शेजारींच औरंगझेबाने बांधलेली एक मशीद आहे. या मशीदीचे ते उंचच उंच मनोरे मुसलमानी धर्माच्या राजस गुणाची व हिंदुधर्माच्या सात्विक गुणाची एकसमयावच्छेदेंकरून ऊचैःघोषणा करीत आहेत असें मला वाटलें. कारण औरंगझेबानंतर मोंगल पादशाही मोडकळीस आल्यावर हिंदु राजांच्या मनांत असतें तर त्यांना त्या मशीदीचा नाश करता आला असता; पण तसें कांहीं एक न करितां अहिल्याबाईनें संकुचित जागेत हल्लींचें छोटे विश्वेश्वराचें देऊळ बांधलें. या देवळाच्या कळसाला सोन्याचा मुलामा पंजाबच्या रणजितसिंगाने दिला! याप्रमाणे या देवळाच्या हल्लींच्या प्रेक्षणीय स्वरूपाचें श्रेय दक्षिणी व पंजाबी अशा दोन मुकुटमंडित विभूतींना आहे. यावरून हिंदुस्थानातील विविध प्रांतांतील हिंदी लोकांचें धार्मिक ऐक्य दृग्गोचर होतें असें मला वाटलें. हा घाट पाहिल्यावर व विश्वेश्वराचें दर्शन घेतल्यावर आम्ही गंगेच्या (हे पाणी हरिद्वाराहून आणतात असें कळलें) पाण्याची एक छोटी लाखबंद गिंडी विकत घेतली व<noinclude></noinclude> mgx6uv4fuijumbtjdfm1p49ehc8r6cy पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१० 104 110986 233179 2026-07-15T11:51:28Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233179 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७०|काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>मग ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या घाटाशी आलो. हा घाट पार ढासळला आहे. त्याचे दुरुस्तीचे काम चालू होतें. त्या कामावरचे एंजिनीयर भेटले व त्यांनी नवा घाट कसा बांधण्यांत येत आहे हें आम्हांस सांगितलें. या घाटाच्या दुरुस्तीस किंवा पुनरुद्धारास साडेसहा लाख रुपये लागणार आहेत असें त्यांनी सांगितलें. हा घाट पाहून झाल्यावर आम्ही पंचगंगा घाट पाहिला. पंचतीर्थापैकीं हें चवथें तीर्थ येथे पूर्वी बिंदुमाधवाचें देऊळ होतें व त्याच्या जोत्यावर उंच उंच मनोऱ्यांनी अलंकृत अशी मशीद औरंगझेबाने बांधली आहे!<br>{{gap}}हिंदुधर्माचा पाडाव व पाणउतारा करण्याचा औरंगझेबाचा अट्टाहास काशींत जागोजाग दृष्टीस पडतो. इतका दुसऱ्या क्षेत्रीं दिसून येत नाहीं. काशी क्षेत्रावर त्याचा फारच रोष होता यांत शंका नाहीं. पंचगंगा घाटानंतर फारसे मोठे घाट नाहींत. पंचतीर्थापैकी शेवटचें व पाचवें तीर्थ म्हणजे वारणा व गंगा या दोन नद्यांचे संगमस्थान हे होय. पण हे काशी शहरापासून पुष्कळच दूर असल्यामुळे भाविक यात्रेकरूखेरीज तेथें कोणी जात नाहीं. अर्थात् आम्ही तेथपर्यंत गेलों नाहीं. पंचगंगा घाट पाहून होतो तोंच बारा वाजून गेले. म्हणून टांगा करून आम्ही तडक प्रो. गोडबोले यांचे बंगल्यावर गेलों.<br>{{gap}}मागे सांगितलेच आहे कीं, माझ्या काशीनिवासाच्या शेवटच्या दिवशीं मी भाऊराव दामले यांचेकडे उतरण्यास आलो. तेथे भोजनप्रसंगी रा. बाबूराव पराडकर या पुनर्विवाहित गृहस्थाशी परिचय झाला. हे गृहस्थ '''आज''' या हिंदी वर्तमानपत्राचे संपादक आहेत. गृहस्थ प्रगतिपर विचाराचे व कट्टे राष्ट्रभक्त दिसले. दोन प्रहरी काशींतील बाजार पाहिला व मुलांकरितां लाकडी खेळणी व बायका मंडळींकरितां खण विकत घेतले. सायंकाळी होडी करून पुनः एकदां गंगेचा चन्द्रकोरी प्रवाह व नदीमधून दिसणारी काशीशहराची शोभा शेवटची पाहिली. हल्लीं घाटांच्या दोन तीन मैलांत म्युनिसिपालिटीनें उंच उंच खांबावर<noinclude></noinclude> 17zpf50jpkrivc1y0pdugy3hm46hyps पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२११ 104 110987 233180 2026-07-15T11:54:01Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233180 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||काशी अथवा बनारस|१७१}}</noinclude>टांगलेले विजेचे प्रचंड दिवे अंतरा अंतरावर लाविले आहेत. यामुळे सर्व घाटांवर चांगला प्रकाश पडतो! होडींतून परत आल्यावर आम्ही घाटा- घाटानें थोडेसें हिंडलों; व मग चालतच भाऊराव दामले यांचे बिऱ्हाडी आलों. रात्रींचें जेवण झाल्यावर मी कँटोनमेंट स्टेशनवर झोपावयास अलों. कारण अयोध्येला जाणारी गाडी पहांटे सवाचार वाजतां निघावयाची होती. तेव्हां स्टेशनवर येऊन झोपणेंच जास्त सोयीचें व सुखाचें होतें. ठरल्या वेळीं आगगाडी आली व मी अयोध्येकडे प्रयाण केलें. झालें, येथेंच माझें काशीयात्रा- पुराण संपलें.<br><br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> f8i1wgriqzlh7tl0vv2udj35aujohgy