विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.48.0-wmf.3
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/११७
104
113054
238881
238835
2026-11-07T13:38:39Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
238881
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>गीत, मुद्दाम जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष जावे अशा आवाजात!

{{gap}}कुतूहल चाळवले. मनात थोडी धास्तीही वाटत होती. तरीही आणखी एक कडू करंजाचं झाडं गाठलं तर तिथे झाडाला पाठ टेकवून तीन बाजूला तीन स्वेटर आणि नाकात चमकणारी चमकी. हा या रस्त्याला आज वेगळाच प्रकार दिसत होता. आजवर या रस्त्यावर असे काही नव्हते. नजर थोडी आजूबाजूला टाकली. पूर्वीच्या मोकळ्या रानजमिनीत कितीतरी झोपड्या आता वाढल्या होत्या. एखादा स्वेटर आणि जोडीला एखादी पुरुष आकृती एखाद्या झोपडीकडे जाताना दिसत होती. सगळ्याच स्वेटरधारी, गणवेश असल्यासारख्या आता हळूहळू रस्त्याच्या या बदलाचा अर्थ लक्षात येत होता. तशीच परत फिरले. येताना एक झाड कडू करंजाचे एकटे स्वेटरधारी नसलेले. मोहराने नुसते फुलारून लवलवले होते. त्याचा उग्र कडवट पण मधुर गंध पुढे जाऊ देईना. मोहराने लगडलेली एखादी फांदी पुढे जाऊन तोडण्याचा... बरोबर नेण्याचा मोह आवरता आला नाही. तोडण्यासाठी फांदी वाकवली पण ती ओली फांदी तुटता तुटेना. भारी चिवट, पण मोहही आवरेना; हात काचायला लागले. खूप खटपटीनंतर फांदी हातात आली. नाकाशी धरून पोटभर हुंगली-अखेर कोणतेही बहराचे मोहर मोहात पाडतातच. घटकाभर त्याच धुंदीत असताना पावले घराकडे वळली. तोच... "हे काय ? इतक्या रात्रीच्या इकडे कुठे?" एक ओळखीचा आवाज कानावर आला. "असेच, फिरायला" संभाषण तुटले, पण समोरचा आश्चर्याचा बहर अजून ओसरला नव्हता. न राहवून पुन्हा संभाषण सुरू केल्यासारखे... "एकट्या येत जाऊ नका अशा रात्री. या बाजूला वस्ती चांगली नाही. आमचा नाइलाज आहे. घरच इथे आहेना पूर्वीपासून! आम्हीही हल्ली लवकर घरी परततो. "..." पण पूर्वी असे काही नव्हते हो या बाजूला. हल्लीच दिसतेय?" स्पष्ट उल्लेख न करता नेमका अभिप्राय माहीत असल्यासारखे बोलणे चालू होते.

{{gap}}"अहो या सगळ्या कर्नाटकाकडून आलेल्या बायका. सगळी झोपडपट्टी यांचीच. अलीकडच्या तीन-चार महिन्यातली. वाढतच चालली आहे दिवसेंदिवस. कीड आहे पहा ही गावाला लागत असलेली पण तुम्ही जा पाहू लवकर!"
{{gap}}आता हातातली कडू करंजाची फुललेली फांदी घरात फुलदाणीत आहे. हा एक सोस! कुठलीही रानफुलं असली तरी घरात आणायचा! या फांदीचा गंध घरभरून दरवळतोय. मोठी शोभीवंत बाकदार कमान झालीय तिची. एरव्ही सुगंधाने मन वेडे-बावरे होते. पण का कोण जाणे आज विषण्ण होत होते; उदास होत होते. त्या वाटेवरचा शिरीष एवढा सहज आठवत नाही. आठवते आहे फक्त कडू करंजाचे झाड. त्याखालचे ते स्वेटर, नाकातल्या चमक्या आणि अत्यंत<noinclude>{{right|कडू करंजाचं झाड / ११६}}</noinclude>
i2o1dzxtcqgr9qpfxb7ssdejp28xwl0
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/११८
104
113055
238882
238836
2026-11-07T13:44:01Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
238882
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>भयानकपणे गाइली जाणारी ती ओळ... " शोला दबाके रखना' आणि इशारा मिळालेले ते शब्द, "ही कीड वाढतच चालली आहे." ही 'कीड'! खरंच या सगळ्या बायका हौस म्हणून असा रस्त्यावर बाजार मांडत असतील का? यात अगतिकता, परिस्थिती शरणता, कौटुंबिक आणि सामाजिक परंपरा यांचा भाग किती असेल? की या स्त्रियांना 'खरोखर हाच आपला व्यवसाय आहे, असे प्रामाणिकपणे वाटत असेल! यातून बाहेर यावेसे वाटत असेल का? त्यासाठी खरोखर व्यावहारिक मार्ग यांना उपलब्ध होत नसतील का? की, कायदे आणि सरकारी तरतुदी फक्त कागदावरच राहतात. असेही कानावर येते की अलीकडे याच कडू करंजाच्या झाडाखाली एखादी खाकी वर्दी चमकीवालीकडून चिरमिरी घेतानाही दिसते. क्रमाने ते ही मागे पडले.

{{gap}}काळ उलटला पण स्मरणातील फुलदाणीतली ती कडू करंजाची फांदी अगतिकपणे वाकली आहे असे वाटत राहिले आणि त्याच वेळी आठवली आजोळी गेल्यावर आजी लावत असलेली कडू करंजाच्या तेलाची भट्टी! ही गोष्ट साठ एक वर्षामागची! रानात कडू करंजाची, एरंडाची भरपूर झाडे तेव्हा असायची. सुट्टीतल्या आमच्या अनेक उद्योगात एरंड्याच्या लंबगोल करड्या ठिपक्यांच्या बिया आणि कडू करंजीच्या अक्षरशः अगदी इवल्याशा करंजीच्या आकाराच्या लाल मातीच्या मातकट रंगाच्या बिया गोळा करून आणणे आणि परसातल्या चुलीजवळ त्यांचे दोन ढीग रचणे, मग आजी खुश होत असे. मग वर्षभरासाठी त्यांची तेलं काढायच्या तिच्या भट्ट्या लागत. दगडी चुलाण्यांवर मोठ्या पातेल्यात बिया ठेचून टाकायच्या, त्या पाणी घालून खूप उकळायच्या आणि तेलाचा तवंग वर दिसायला लागला की ते थंड होऊ द्यायचे. ते तेल ओतून काढण्याचे काम मोठे कौशल्याचे असे आणि गडी माणसांच्या मदतीने आजी ते करीत असे. दोन्हींची साठवण निगुतीनी केली जायची. एरंडीच्या तेलाचा उपयोग सुप्रसिद्धच आहे. महिना-पंधरा दिवसातून भल्या सकाळी चमचा दोन चमचा तेल पोराबाळांना नाक दाबून पिणे भाग असायचे. आजच्या स्कूटर मोटर सर्व्हिसिंगच्या भाषेत पोरांच्या एकूण कोठ्याचेच ओव्हरऑईलिंग होऊन जाई. आज त्याच्या सुधारित आवृत्त्या निघाल्या आहेत.

{{gap}}कडू करंजाची बुधली भरणे हा एक प्रापंचिक काटकसरीचा भाग होता. वीज नव्हती, रॉकेल फारसे खेड्यात मिळत नसे. परवडतही नसे. मग अंगणात, गुरांच्या गोठ्यात, पोरांच्या ओसरीवर आणि दिवाळीतही दिवे लावायला करंजाचे तेल उत्तम काम करी. अंधारी जागा प्रकाशमान करी. आणखी एक म्हणजे बैलगाडीच्या चाकात लुब्रिकेटिंग म्हणून नळ्यात करंजाचे तेल भरले जाई. बैलांच्या खांद्यांना<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / ११७}}</noinclude>
fgd0c5zxt2d31o9wxdadkd2d6ay1wj4
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/११९
104
113056
238883
238837
2026-11-07T13:51:36Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
238883
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>नांगर, औत, मोटा, गाड्या ओढून हमखास जखमा होत, त्यावर मलम आणि निर्जंतुकीकरणासाठी हळदीत खलून ते तेल लावले जाई. घरात छताच्या कडीपाटाला, तुळईला, पलंगांना... लाकडाला वाळवी-उधई लागली तर कडू करंजाच्या तेलात चिंधी बुडवून लावले जाई. वाळवी मारणे, प्रतिबंध करण्याचे गुण ही या कडू तेलाची खासीयत; चुकून तेलाचा जिभेला स्पर्श झाला तर खरी कडू चव कळायची! घरात दारात उजेड पाडणारी. आणि घरातली कीड नाहिशी करणारी ही गुणी झाडे आता फक्त 'त्या सद्गृहस्थांच्या भाषेत' 'कीडी'ला फक्त आसरा देण्याचेच काम करतात का?

{{gap}}कडू करंजाचे तेल काढणे, त्यांचे वापर हे सगळे आताचे ग्रामीण शेतकरी विसरूनच गेले आहेत कां? कधी आणि कसे झाले सगळे? शहरी जीवनात आपल्याही किती विस्मरणात गेला हा काळ! आता कोणी कृषीविद्यापीठे, प्रयोगशील शेतकरी कडू करंजाचा असा शोध घेत असतील का?

{{gap}}मी जी झाडे पाहिली होती 'त्या' रस्त्याने, त्यालाही आता तीस-एक वर्षे झाली. अजून ती झाडे तिथे आहेत की नाही? हे पहायलाही गेल्या कित्येक वर्षांत सवड झाली नाही. स्मरणशक्ती समाजाचीच नव्हे तर व्यक्तीचीही किती क्षीण असते, असेही आज वाटत आहे.

{{gap}}कसा कोण जाणे तो फिरण्याचा प्रसंग आठवला आणि मग कडू करंजाची एक स्मरणसाखळी उलगडत गेली. कदाचित आता प्रत्यक्ष पायी फिरणे कमी आणि आठवणीत फिरणे वाढत चालल्याचा हा परिणाम असेल.
पण अजूनही कुठे सापडले तर मला ते कडू करंजाचे झाड हवे आहे.<noinclude>{{right|कडू करंजाचं झाड / ११८}}</noinclude>
b1hajpb2anc3j6xvdtq5jbhluk5236j
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/१२०
104
113057
238884
238838
2026-11-07T13:56:07Z
JayashreeVI
4058
238884
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''कळतं पण वळत नाही'''}}}}
{{gap}}वेळेची आणि मार्गांची पद्धतशीर आखणी करून प्रवास करणाऱ्यांचं मला नेहमीच फार कौतुक वाटतं. मला हे कधी जमत नाही; पण आखणी करून प्रवास करणाऱ्यांचा हेवा मात्र मुळीच वाटत नाही; कारण आपण ठरवल्यापेक्षा अनपेक्षितपणे वेगळाच असा अनुभव अनेकदा येतो आणि तो खूप छान असतो..

{{gap}}परदेश प्रवास ही काही आता अपूर्वाई राहिलेली नाही; मात्र माझ्यासारखीला ती अनपेक्षित मिळालेली संधी ही काहीशी अपूर्वाईच होती. म्हणून प्रवासात अमुकच करायचे-पहायचे असा आग्रह नव्हता. अमेरिकेच्या एका विद्यापीठाच्या निमंत्रणावरून आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी मी गेले होते. चर्चासत्र संपल्यावर एक दिवस रिकामा होता आणि बहुतेक सहकारी निघून गेले होते. एक महाराष्ट्रीय मैत्रीण मीरा (ही समाजशास्त्रज्ञ कोसंबींची मुलगी) तेवढी त्या हॉटेलवर होती. सकाळी मी आरामात असतानाच ध्यानी मनी नसलेल्या ग्रैंडकॅनॅइनच्या सहलीची संधी घेऊन ती आली. सकाळी निघून आम्ही रात्री परत येऊ शकणार होतो.

{{gap}}वाटेत एका विस्तीर्ण घळीत गाडी थांबली. आमच्या गाडीतली माणसं आणि ती गाडी त्या अतिविशाल भव्य घळीत अक्षरशः एवढीशी खेळण्यातली वाटत असणार. भोवताली आमच्या उंचीच्याच पांढऱ्याशुभ्र डेरेदार फुलांनी लगडलेली झाडं. ते दृश्य पाहून अक्षरश: मंत्रमुग्ध व्हायला झालं.

{{gap}}इतकी असंख्य फुलांनी लगडलेली झाडं, राखणदार कोणी नाही. माझी पावलं आपोआप झाडाकडे वळली. वाकलेली फांदी हाती घेऊन फुलं तोडणार तोच मैत्रिणीनं थांबवलं. भानच नव्हतं मला. गाडीतली सगळी माणसं विलक्षण अचंब्यानं माझ्याकडे पाहत होती. आपलं काय चुकलं हे मला कळेचना! पाहणाऱ्यांचे चेहरे असे की कोण्या भामट्या बाईला बरोबर आणलय्!
{{gap}}"का? काय झालं?" मैत्रिणीला विचारलं. मनात एक शंका आली की

११९<noinclude></noinclude>
918rponkku13r8iznb1oeh9ycqiyuny
238885
238884
2026-11-07T13:57:06Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
238885
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''कळतं पण वळत नाही'''}}}}
{{gap}}वेळेची आणि मार्गांची पद्धतशीर आखणी करून प्रवास करणाऱ्यांचं मला नेहमीच फार कौतुक वाटतं. मला हे कधी जमत नाही; पण आखणी करून प्रवास करणाऱ्यांचा हेवा मात्र मुळीच वाटत नाही; कारण आपण ठरवल्यापेक्षा अनपेक्षितपणे वेगळाच असा अनुभव अनेकदा येतो आणि तो खूप छान असतो..

{{gap}}परदेश प्रवास ही काही आता अपूर्वाई राहिलेली नाही; मात्र माझ्यासारखीला ती अनपेक्षित मिळालेली संधी ही काहीशी अपूर्वाईच होती. म्हणून प्रवासात अमुकच करायचे-पहायचे असा आग्रह नव्हता. अमेरिकेच्या एका विद्यापीठाच्या निमंत्रणावरून आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी मी गेले होते. चर्चासत्र संपल्यावर एक दिवस रिकामा होता आणि बहुतेक सहकारी निघून गेले होते. एक महाराष्ट्रीय मैत्रीण मीरा (ही समाजशास्त्रज्ञ कोसंबींची मुलगी) तेवढी त्या हॉटेलवर होती. सकाळी मी आरामात असतानाच ध्यानी मनी नसलेल्या ग्रैंडकॅनॅइनच्या सहलीची संधी घेऊन ती आली. सकाळी निघून आम्ही रात्री परत येऊ शकणार होतो.

{{gap}}वाटेत एका विस्तीर्ण घळीत गाडी थांबली. आमच्या गाडीतली माणसं आणि ती गाडी त्या अतिविशाल भव्य घळीत अक्षरशः एवढीशी खेळण्यातली वाटत असणार. भोवताली आमच्या उंचीच्याच पांढऱ्याशुभ्र डेरेदार फुलांनी लगडलेली झाडं. ते दृश्य पाहून अक्षरश: मंत्रमुग्ध व्हायला झालं.

{{gap}}इतकी असंख्य फुलांनी लगडलेली झाडं, राखणदार कोणी नाही. माझी पावलं आपोआप झाडाकडे वळली. वाकलेली फांदी हाती घेऊन फुलं तोडणार तोच मैत्रिणीनं थांबवलं. भानच नव्हतं मला. गाडीतली सगळी माणसं विलक्षण अचंब्यानं माझ्याकडे पाहत होती. आपलं काय चुकलं हे मला कळेचना! पाहणाऱ्यांचे चेहरे असे की कोण्या भामट्या बाईला बरोबर आणलय्!
{{gap}}"का? काय झालं?" मैत्रिणीला विचारलं. मनात एक शंका आली की<noinclude>{{center|११९}}</noinclude>
9f6alh3330c0ps4pws7naspcpar3jjh