विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.48.0-wmf.3 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:निरगाठ सुरगाठ.pdf/१२१ 104 113061 238886 2026-11-10T06:34:09Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 238886 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>फुलं जहाल विषारी वगैरे तर नसावीत? कुठे तरी जहाल विषारी झाडांबद्दल काहीबाही वाचलेलं आठवत राहिलं. विशेषतः ॲमेझॉन, नाइल अशा नद्यांच्या खोऱ्यात, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाच्या घनदाट जंगलात काही मोहक वनस्पती असतात. त्यांच्या मोहिनीनं सुरेख रंग आकारांनी प्राणी तिकडे आकर्षित होतात, पण त्या मोहिनी रुपाआड फार घातक भस्मासुर लपलेला असतो. "स्पर्शासह मरणही आणी ती तुझ्या जीवाची राणी" असं काही अप्रूप त्या फुलात आहे की काय? असे विचार क्षणार्धात चमकून जात असतानाच मैत्रीण धावत जवळ आली आणि नाठाळ मुलाला दटावणी द्यावी त्या स्वरात मातृभाषेत म्हणाली, "असा झाडा-फुलांना हात लावायचा नसतो इथं सार्वजनिक ठिकाणी. राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान केलं म्हणून पोलीस केस होऊ शकते." बापरे! 'पोलिस केस' शब्दाची जरबच मोठी ठरली. या परक्या देशात खरंच असं काही घडलं तर...! पण एवढ्या मोठ्या त्या घळीतल्या जंगलातली चार-सहा फुलं तोडली एखाद्यानं, तर असं काय मोठं 'राष्ट्रीय नुकसान'(?) झालं असतं? ते माझ्या भारतीय मनाला अजून उलगडलेलं नाही. इथं वर्षानुवर्षे वाढलेल्या वृक्षांची जंगलेच्या जंगले तोडणारे राष्ट्रीय संपत्तीचे दरोडेखोर उजळ माथ्याने फिरत असतात. वर बढाई मारतात. त्या देशातल्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला हे कळवून घेणं अंमळ कठीणच जाणार ना!
{{gap}}आमच्याकडे सगळा उलटाच कारभार. रस्त्यावर सुरेख वाढलेल्या डेरेदार झाडावर उन्हाळ्यात उनाड पोरे चढतात आणि गंमत म्हणून फांद्याच्या फांद्या तोडून झाडाचा पार खराटा करतात. त्यांना थोडं सांगायला गेलं की, उलट त्यांचे आईबाप कंबर कसून भांडायला येणार. "तुमच्या... चं काय गेलं? झाड काय तुमचं खाजगी आहे? रस्त्यावरच्या सार्वजनिक झाडावर आमचाही अधिकार तेवढाच आहे.?" आता काय बोलणार?
{{gap}}रेल्वेत लिहिलेले असतं. "यह गाडी भारतीय जनता की संपत्ती है।" या संपत्तीची वाटेल तशी लूट करायचा आणि नासधूस करायचा हक्क मात्र सगळे बजावतात. उत्तर प्रदेशात एकदा प्रवास करीत असताना भरल्या गाडीत रेल्वेचे दिवे आणि पंखे यांच्या तारा तोडणारी उनाड मुलांची टोळकी सुखेनैन हिंडताना पाहिली. कोणीच त्या मुलांना काही बोलत नव्हतं. मलाच राहवेना म्हणून थोडं नम्रपणेच सांगण्याचा प्रयत्न केला. तर "मॅडम, आपको आखिरतक जाना है ना?" असा जरबदार प्रश्न विचारून गप्प बसवलं होतं. डब्यातल्या तथाकथित 'सभ्य' प्रवाशांनीही गप्प बसायचा सल्ला दिला होता. अशा वातावरणातून गेलेल्या माझ्या सारखीला 'राष्ट्रीय संपत्तीच्या जपणुकीची ही अमेरिकन मानसिकता<noinclude>{{right|कळतं पण वळत नाही / १२०}}</noinclude> qmtkr60zlbvpc5t9uj6t72mcf2zomnp 238887 238886 2026-11-10T06:34:56Z JayashreeVI 4058 238887 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>फुलं जहाल विषारी वगैरे तर नसावीत? कुठे तरी जहाल विषारी झाडांबद्दल काहीबाही वाचलेलं आठवत राहिलं. विशेषतः ॲमेझॉन, नाइल अशा नद्यांच्या खोऱ्यात, आफ्रिका, ऑस्ट्रेलियाच्या घनदाट जंगलात काही मोहक वनस्पती असतात. त्यांच्या मोहिनीनं सुरेख रंग आकारांनी प्राणी तिकडे आकर्षित होतात, पण त्या मोहिनी रुपाआड फार घातक भस्मासुर लपलेला असतो. "स्पर्शासह मरणही आणी ती तुझ्या जीवाची राणी" असं काही अप्रूप त्या फुलात आहे की काय? असे विचार क्षणार्धात चमकून जात असतानाच मैत्रीण धावत जवळ आली आणि नाठाळ मुलाला दटावणी द्यावी त्या स्वरात मातृभाषेत म्हणाली, "असा झाडा-फुलांना हात लावायचा नसतो इथं सार्वजनिक ठिकाणी. राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान केलं म्हणून पोलीस केस होऊ शकते." बापरे! 'पोलिस केस' शब्दाची जरबच मोठी ठरली. या परक्या देशात खरंच असं काही घडलं तर...! पण एवढ्या मोठ्या त्या घळीतल्या जंगलातली चार-सहा फुलं तोडली एखाद्यानं, तर असं काय मोठं 'राष्ट्रीय नुकसान'(?) झालं असतं? ते माझ्या भारतीय मनाला अजून उलगडलेलं नाही. इथं वर्षानुवर्षे वाढलेल्या वृक्षांची जंगलेच्या जंगले तोडणारे राष्ट्रीय संपत्तीचे दरोडेखोर उजळ माथ्याने फिरत असतात. वर बढाई मारतात. त्या देशातल्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला हे कळवून घेणं अंमळ कठीणच जाणार ना!
{{gap}}आमच्याकडे सगळा उलटाच कारभार. रस्त्यावर सुरेख वाढलेल्या डेरेदार झाडावर उन्हाळ्यात उनाड पोरे चढतात आणि गंमत म्हणून फांद्याच्या फांद्या तोडून झाडाचा पार खराटा करतात. त्यांना थोडं सांगायला गेलं की, उलट त्यांचे आईबाप कंबर कसून भांडायला येणार. "तुमच्या... चं काय गेलं? झाड काय तुमचं खाजगी आहे? रस्त्यावरच्या सार्वजनिक झाडावर आमचाही अधिकार तेवढाच आहे.?" आता काय बोलणार? {{gap}}रेल्वेत लिहिलेले असतं. "यह गाडी भारतीय जनता की संपत्ती है।" या संपत्तीची वाटेल तशी लूट करायचा आणि नासधूस करायचा हक्क मात्र सगळे बजावतात. उत्तर प्रदेशात एकदा प्रवास करीत असताना भरल्या गाडीत रेल्वेचे दिवे आणि पंखे यांच्या तारा तोडणारी उनाड मुलांची टोळकी सुखेनैन हिंडताना पाहिली. कोणीच त्या मुलांना काही बोलत नव्हतं. मलाच राहवेना म्हणून थोडं नम्रपणेच सांगण्याचा प्रयत्न केला. तर "मॅडम, आपको आखिरतक जाना है ना?" असा जरबदार प्रश्न विचारून गप्प बसवलं होतं. डब्यातल्या तथाकथित 'सभ्य' प्रवाशांनीही गप्प बसायचा सल्ला दिला होता. अशा वातावरणातून गेलेल्या माझ्या सारखीला 'राष्ट्रीय संपत्तीच्या जपणुकीची ही अमेरिकन मानसिकता<noinclude>{{right|कळतं पण वळत नाही / १२०}}</noinclude> kt6n6fgzu1mg7duy7t3m74dmurbj82r पान:निरगाठ सुरगाठ.pdf/१२२ 104 113062 238888 2026-11-10T06:35:24Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ खूप प्रभावित करून गेली. खरे तर त्या निर्मनुष्य जंगलात कोणी राखणदार, पोलीस नजरेच्या टप्प्यातही येण्याची शक्यता नव्हती. पण तेथील सर्वसामान्य नागरिकाच्या मनातला अदृश्य रा..." 238888 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ खूप प्रभावित करून गेली. खरे तर त्या निर्मनुष्य जंगलात कोणी राखणदार, पोलीस नजरेच्या टप्प्यातही येण्याची शक्यता नव्हती. पण तेथील सर्वसामान्य नागरिकाच्या मनातला अदृश्य राखणदार जास्त दक्ष होता; त्याचीच अपूर्वाई होती. याच प्रवासातला आणखी एक अनुभव ! एक पशुपक्षी संग्रहालय आणि त्यासंदर्भातलं एक वस्तुसंग्रहालय पाहत असतानाचा ! आपल्याकडच्या भाषेत बोलायचं तर बालवाडीतल्या, फार तर पहिलीच्या वर्गातल्या मुलामुलींची सहल आलेली होती. मुलं मजेत प्राण्यांच्या पिंजऱ्याबाहेरून हिंडत होती. "प्राण्यांना प्रेक्षकांनी आपल्या जवळचे पदार्थ खाऊ घालू नयेत, त्यांना हात लावू नये," अशा अर्थाचे फलक जागोजागी लावले होते आणि प्रेक्षक त्या सूचनांची अंमलबजावणी करीत होते. मोठ्यांनी हे केले तर आश्चर्य नव्हते पण शिक्षिकेने मुलांच्या हाती नुकतीच चॉकलेट दिली होती. एकीकडे मुले ते खात होती; पण चुकूनही एका मुलाने पिंजऱ्यातल्या प्राण्याला ते देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र चॉकलेट कां द्यायचे नाही? असा प्रश्न आपल्या शिक्षिकेला विचारून आपले कुतूहल मात्र ती मुले व्यक्त करीत होती. उत्तराने त्यांचे समाधान झाल्याचे दिसत होते. विशेष कौतुक आणखी एका गोष्टीचे वाटले. चॉकलेट खाऊन झाल्यावर आपल्या हाताच्या चिमटीत प्रत्येक मुलाने चॉकलेटच्या आवरणाचा कागद ठेवला होता आणि पुढे जेव्हा कचऱ्याचे कोंडाळे लागले तेव्हा बरोबर त्या कोंडाळ्यात पडेल तशा बेताने टाकला. ही शिस्त तर सगळीकडेच दिसते. कोठेही खाद्यपेय विक्री केंद्रात किंवा बागेत खाद्यपदार्थांचे रिकामे कागद, प्लॅस्टिकच्या बशा पेले इतस्ततः टाकले जात नव्हते. म्हातारी माणसे बागेत येत. काही खाणे- पिणे करीत आणि आसपास कोंडाळे नसेल तर रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा भरून नेत आणि कोंडाळे दिसताच नेमकेपणाने त्यात टाकीत. - आपल्याच मोटारीतून किंवा मिनीबसमधून छोट्या सहलीला जातानाही हा अनुभव सार्वत्रिकपणे येत असे. वाटेल तेथे रस्त्यावर खाद्य-पेयांच्या रिकाम्या आवरणाचा कचरा वाहनाच्या खिडकीतून न टाकण्याचे वळण सगळ्यांच्याच अंगवळणी लहानपणापासून पडल्याशिवाय हे घडत नाही. परदेशातल्या सार्वजनिक बागा, बाजार, रस्ते यांच्या अपरंपार स्वच्छतेची अपूर्वाई आपल्यासारख्यांना नेहमीच वाटते आणि आपल्याकडच्या घाणीशी, अनास्थेशी आपोआपच तुलना होते. शेवटचा एक शेरा असतो तो सरकारवर ! सरकार, शासनयंत्रणा, महानगरपालिका ते ग्रामपंचायत अशासारख्या संस्थांनी सामान्य नागरिकाने जिथे-तिथे केलेली घाण अष्टौप्रहर झाडू चालवले तरी सामान्य निरगाठ सुरगाठ / १२१<noinclude></noinclude> c0c78fihvu9oj0mws8cl1ehyk6saxhx 238889 238888 2026-11-10T06:43:44Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 238889 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>खूप प्रभावित करून गेली. खरे तर त्या निर्मनुष्य जंगलात कोणी राखणदार, पोलीस नजरेच्या टप्प्यातही येण्याची शक्यता नव्हती. पण तेथील सर्वसामान्य नागरिकाच्या मनातला अदृश्य राखणदार जास्त दक्ष होता; त्याचीच अपूर्वाई होती.
{{gap}} याच प्रवासातला आणखी एक अनुभव! एक पशुपक्षी संग्रहालय आणि त्यासंदर्भातलं एक वस्तुसंग्रहालय पाहत असतानाचा!
{{gap}}आपल्याकडच्या भाषेत बोलायचं तर बालवाडीतल्या, फार तर पहिलीच्या वर्गातल्या मुलामुलींची सहल आलेली होती. मुलं मजेत प्राण्यांच्या पिंजऱ्याबाहेरून हिंडत होती. "प्राण्यांना प्रेक्षकांनी आपल्या जवळचे पदार्थ खाऊ घालू नयेत, त्यांना हात लावू नये," अशा अर्थाचे फलक जागोजागी लावले होते आणि प्रेक्षक त्या सूचनांची अंमलबजावणी करीत होते. मोठ्यांनी हे केले तर आश्चर्य नव्हते पण शिक्षिकेने मुलांच्या हाती नुकतीच चॉकलेट दिली होती. एकीकडे मुले ते खात होती; पण चुकूनही एका मुलाने पिंजऱ्यातल्या प्राण्याला ते देण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र चॉकलेट कां द्यायचे नाही? असा प्रश्न आपल्या शिक्षिकेला विचारून आपले कुतूहल मात्र ती मुले व्यक्त करीत होती. उत्तराने त्यांचे समाधान झाल्याचे दिसत होते. विशेष कौतुक आणखी एका गोष्टीचे वाटले. चॉकलेट खाऊन झाल्यावर आपल्या हाताच्या चिमटीत प्रत्येक मुलाने चॉकलेटच्या आवरणाचा कागद ठेवला होता आणि पुढे जेव्हा कचऱ्याचे कोंडाळे लागले तेव्हा बरोबर त्या कोंडाळ्यात पडेल तशा बेताने टाकला. ही शिस्त तर सगळीकडेच दिसते. कोठेही खाद्यपेय विक्री केंद्रात किंवा बागेत खाद्यपदार्थांचे रिकामे कागद, प्लॅस्टिकच्या बशा, पेले इतस्ततः टाकले जात नव्हते. म्हातारी माणसे बागेत येत. काही खाणे-पिणे करीत आणि आसपास कोंडाळे नसेल तर रिकाम्या प्लॅस्टिकच्या पिशवीत कचरा भरून नेत आणि कोंडाळे दिसताच नेमकेपणाने त्यात टाकीत.
{{gap}}आपल्याच मोटारीतून किंवा मिनीबसमधून छोट्या सहलीला जातानाही हा अनुभव सार्वत्रिकपणे येत असे. वाटेल तेथे रस्त्यावर खाद्य-पेयांच्या रिकाम्या आवरणाचा कचरा वाहनाच्या खिडकीतून न टाकण्याचे वळण सगळ्यांच्याच अंगवळणी लहानपणापासून पडल्याशिवाय हे घडत नाही. {{gap}}परदेशातल्या सार्वजनिक बागा, बाजार, रस्ते यांच्या अपरंपार स्वच्छतेची अपूर्वाई आपल्यासारख्यांना नेहमीच वाटते आणि आपल्याकडच्या घाणीशी, अनास्थेशी आपोआपच तुलना होते. शेवटचा एक शेरा असतो तो सरकारवर! सरकार, शासनयंत्रणा, महानगरपालिका ते ग्रामपंचायत अशासारख्या संस्थांनी सामान्य नागरिकाने जिथे-तिथे केलेली घाण अष्टौप्रहर झाडू चालवले तरी सामान्य<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / १२१}}</noinclude> 948ftndmmdb4ozi43on8bj84lc3hmb0 पान:निरगाठ सुरगाठ.pdf/१२३ 104 113063 238890 2026-11-10T06:49:40Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 238890 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>माणसात सुसंस्कृत नागरिकत्वाचा एक अविभाज्य भाग म्हणजे 'स्वच्छता महत्त्वाची आहे, हे जोपर्यंत रुजत नाही तोवर "स्वच्छ शहर/गाव, सुंदर शहर/गाव...?' चे कितीही फलक लावले तरी काय उपयोग होणार?
{{gap}}आपल्याकडून परदेशी प्रवासाला गेलेल्या माणसांच्या स्वभावाची आणखी एक गंमत लक्षात आली. परदेशी कंपनीच्या विमानातून प्रवास करताना, तिकडच्या बागांतून, बाजारातून, दुकानातून, रस्त्यावरून फिरताना तिकडच्या नागरिकांप्रमाणे... क्वचित अधिक काटेकोरपणे स्वच्छतेचे नियम पाळणारा माणूस एअरइंडियाच्या विमानात बसल्याबरोबर त्याच्यात एतद्देशीयत्व संचारत असे आणि इथे-तिथे कागद-कचरा टाकण्याचा त्याचा मूळ स्वभाव उफाळून येत असे. "मूळ स्वभाव जाईना।" असा अनुभव अनेकदा येत राहतो.
{{gap}}आणखी एका वस्तुसंग्रहालयात माध्यमिक शाळेतल्या मुला-मुलींची सहल आलेली दिसली. प्रत्येक मुला-मुलींच्या हाती टाचणवही-पेन होते. मुले स्वतंत्रपणे टाचणे लिहित होती. क्वचित एखाद्या ठिकाणी थांबून हलक्या आवाजात शिक्षक सामूहिकपणे एखाद्या शिल्पाविषयी, वस्तुविषयी काही सांगत. मुले नीट ऐकून टिपणे लिहित. खऱ्या अर्थाने ही शैक्षणिक सहल होती. आपल्याकडच्या शाळेतल्या सहलीत असा एखादा अनुभव अपवादात्मकच असावा.
{{gap}}उलट किल्ले, लेणी अशा ठिकाणी आपली किंवा संबंधितांची नावे कोरून त्या विद्रूप करणाऱ्यांचेच प्रमाण जास्त, असा अनुभव मोठ्या माणसांच्या बाबतीतही येतो.
{{gap}}भारतात असेपर्यंत आपल्या घरातल्या पुरुषाला (पती, मुलगा, भाऊ) चहासुद्धा करून घ्यायची सवय नाही, हे कौतुकाने सांगणाऱ्या बायका परदेशात काही काळ रहायला गेलेला घरातला पुरुष घरात स्वयंपाकाचे प्रयोग कसे करतो आणि फोनवर, पत्रातून निरनिराळ्या पदार्थांच्या कृतींची देवाण-घेवाण कशी करतो, हे दुप्पट उत्साहाने सांगताना दिसतात.
{{gap}}म्हणजे सार्वजनिक स्वच्छता, शिस्त स्वावलंबन या गोष्टींची परदेशात अंमलबजावणी करण्यातच मोठेपणा आहे, असा या माणसांचा समज आहे की काय? आपण आपल्याच देशात उत्स्फूर्तपणे या बाबी आचरणात आणणे म्हणजे पाप आहे, असा तर समज नसावा ? {{gap}}याचा अर्थ पाश्चिमात्य जीवनशैली सर्वथैव आदर्श आहे असे मुळीच नाही; पण आमच्याकडच्या अनेक दोषांचे खापर आपण "पाश्चिमात्यांच्या अनुकरणावर" फोडतो. त्यावेळी आपल्या समाजाला अतिशय उपकारक असलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करायला आपल्याला कोणी मनाई केली आहे का? सार्वजनिक<noinclude>{{right|कळतं पण वळत नाही / १२२}}</noinclude> c9ojzbq73gn52u0f2z0y62sdnusrzvo पान:निरगाठ सुरगाठ.pdf/१२४ 104 113064 238891 2026-11-10T06:50:13Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ स्वच्छता, शिस्त, स्वावलंबन, कामसूपणा अनेक विषयांतील कुतूहल अशा बाबींची संस्कृती आपण आपल्या समाजात का रूजवीत नाही? त्यांचे अनुकरण का करीत नाही? याचाही विचार आपण अधिक तटस्..." 238891 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ स्वच्छता, शिस्त, स्वावलंबन, कामसूपणा अनेक विषयांतील कुतूहल अशा बाबींची संस्कृती आपण आपल्या समाजात का रूजवीत नाही? त्यांचे अनुकरण का करीत नाही? याचाही विचार आपण अधिक तटस्थतेने करायला नको का ? केवळ पाश्चिमात्त्यांमुळे दोषच का यावेत ? गुण का उचलू नयेत? मग तो दोष आपल्या मानसिकतेचा आहे का? की जबाबदाऱ्या झटकण्याचा आहे ? एक दंतकथा सांगितली जाते, काही भारतीय लेखक अमेरिकेत गेले. त्यांच्या तेथील लेखकांशी गप्पा चालू होत्या. पूर्वज गौरवाच्या आपल्या परंपरेनुसार भूतकाळातील राम कृष्णापासून ते गौतमबुद्ध, म. गांधीपर्यंत थोर लोकांची नावे घेत “आमच्या देशात असे मोठे मोठे लोक होऊन गेले." असे एका भारतीय अभिमानाने समारोपाचे विधान केले.. 33 अमेरिकन शिष्टाचारानुसार येथील लेखक म्हणाला, "बरोबर आहे तुमचे म्हणणे, तुमच्या खूप मोठ्या देशात थोडी माणसे खूप उंच होती. आमच्या देशात प्रत्येक लहान माणूस थोडा थोडा उंच व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. ' तात्पर्य, प्रत्येक सामान्य माणूस थोडा थोडा उंच होतो, तेव्हा सर्व समाजाची प्रत सुधारते, हे सगळं कळतं, पण वळत नाही, त्याला काय करायचे ? पर निरगाठ सुरगाठ / १२३ क ि ि www fe fe fine fasse प्र प<noinclude></noinclude> eiby2suwnf4lvb0nqhga916qupe407h 238892 238891 2026-11-10T06:52:32Z JayashreeVI 4058 238892 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>स्वच्छता, शिस्त, स्वावलंबन, कामसूपणा अनेक विषयांतील कुतूहल अशा बाबींची संस्कृती आपण आपल्या समाजात का रूजवीत नाही? त्यांचे अनुकरण का करीत नाही? याचाही विचार आपण अधिक तटस्थतेने करायला नको का ? केवळ पाश्चिमात्त्यांमुळे दोषच का यावेत ? गुण का उचलू नयेत? मग तो दोष आपल्या मानसिकतेचा आहे का? की जबाबदाऱ्या झटकण्याचा आहे ?
{{gap}}एक दंतकथा सांगितली जाते, काही भारतीय लेखक अमेरिकेत गेले. त्यांच्या तेथील लेखकांशी गप्पा चालू होत्या. पूर्वज गौरवाच्या आपल्या परंपरेनुसार भूतकाळातील राम कृष्णापासून ते गौतमबुद्ध, म. गांधीपर्यंत थोर लोकांची नावे घेत “आमच्या देशात असे मोठे मोठे लोक होऊन गेले." असे एका भारतीय अभिमानाने समारोपाचे विधान केले.
{{gap}}अमेरिकन शिष्टाचारानुसार येथील लेखक म्हणाला, "बरोबर आहे तुमचे म्हणणे, तुमच्या खूप मोठ्या देशात थोडी माणसे खूप उंच होती. आमच्या देशात प्रत्येक लहान माणूस थोडा थोडा उंच व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे. ' तात्पर्य, प्रत्येक सामान्य माणूस थोडा थोडा उंच होतो, तेव्हा सर्व समाजाची प्रत सुधारते, हे सगळं कळतं, पण वळत नाही, त्याला काय करायचे? पर क ि ि www fe fe fine fasse प्र प<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / १२३}}</noinclude> d88c8v5c1p4pvpzkk98mb1i54cw4bzy पान:निरगाठ सुरगाठ.pdf/१२५ 104 113065 238893 2026-11-10T06:52:57Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ तारुण्य : तेव्हा आणि आता...! 'ही असली फडकी गुंडाळून हिंडायला लाज नाही वाटत तुम्हाला ! बापाला भीक लागली नाही तुमच्या अजून ! चार वार जास्त मोठं लुगडं विकत घ्यायची ऐपत आहे अजून!... ज..." 238893 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ तारुण्य : तेव्हा आणि आता...! 'ही असली फडकी गुंडाळून हिंडायला लाज नाही वाटत तुम्हाला ! बापाला भीक लागली नाही तुमच्या अजून ! चार वार जास्त मोठं लुगडं विकत घ्यायची ऐपत आहे अजून!... जरा लेकीला समजवून सांगा तुमच्या. (हे अर्थात लेकीच्या आईला उद्देशून वडिलांचे उद्गार ! ) 'अग पण आई, वर्गातल्या सगळ्या मुली हल्ली पाचवारीच नेसतात. परवा नव्या आलेल्या लिमयेबाईसुद्धा पाचवारीच...' 'अगं पण तुझ्या बाबांना आवडत नाही तर नाही नेसू..' 'अं... मी नाही हं असलं काही ऐकणार...!' मग आठ-दहा दिवस धुसफूस वडिलांचा एकूणच माय-लेकींशी अबोला.... गाडं पूर्ववत्. मधल्या काळात वाड्यात नवीन साडी नेसू लागलेल्या म्हणजे तेरावं सरत आलेल्या आणखी दोघी-चौघी पाचवारी नेसून 'शेपटे फलकारीत' (ही म्हातान्या बायकांनी केलेली खास तारीफ!) हिंडू लागल्या आणि दोन-तीन वर्षांत मी साडी नेसायच्या अवस्थेला येईपर्यंत असले वाद मनातसुद्धा न येण्याइतकी पाचवारी साडी रूळली. हा प्रसंग फार जुना नाही. नाटकातला तर नाहीच. चाळीस एक वर्षांपूर्वी आमच्या पुण्याच्या वाड्यात घडलेला हा प्रसंग ! माझ्या आत्याच्या मैत्रिणीच्या घरातला. माझ्या आत्याचं तेव्हा लग्न व्हायचं होतं. ती चांगली 'सतरा वर्षांची घोडनवरी' झालीय असे शेरे ज्येष्ठ बायका जाता-येता मारीत. आता या पार्श्वभूमीवर परवा परवाचा एक प्रसंग! शहरात मिसळू पाहत असलेल्या खेड्यातली कॉलेजमध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी ! सकाळी पहिल्या तासाला पाहिलं तर साडी नेसलेली. मधल्या सुटीनंतर पंजाबी सलवार खमीसमध्ये ! पुन्हा कॉलेजातून परत जाताना साडी ! हा काय विविध पोशाख स्पर्धेचा प्रकार ! म्हणून कुतूहलानं तिला विचारलं, तर उत्तर मिळालं, १२४<noinclude></noinclude> ir3e12jj7uvukadrxcd815gs2x2mp2n