विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.48.0-wmf.4
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/१२४
104
113064
238894
238892
2026-11-11T11:06:42Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
238894
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>स्वच्छता, शिस्त, स्वावलंबन, कामसूपणा अनेक विषयांतील कुतूहल अशा बाबींची संस्कृती आपण आपल्या समाजात का रूजवीत नाही? त्यांचे अनुकरण का करीत नाही? याचाही विचार आपण अधिक तटस्थतेने करायला नको का? केवळ पाश्चिमात्त्यांमुळे दोषच का यावेत? गुण का उचलू नयेत? मग तो दोष आपल्या मानसिकतेचा आहे का? की जबाबदाऱ्या झटकण्याचा आहे?

{{gap}}एक दंतकथा सांगितली जाते, काही भारतीय लेखक अमेरिकेत गेले. त्यांच्या तेथील लेखकांशी गप्पा चालू होत्या. पूर्वज गौरवाच्या आपल्या परंपरेनुसार भूतकाळातील राम कृष्णापासून ते गौतमबुद्ध, म. गांधीपर्यंत थोर लोकांची नावे घेत “आमच्या देशात असे मोठे मोठे लोक होऊन गेले." असे एका भारतीयाने अभिमानाने समारोपाचे विधान केले.

{{gap}}अमेरिकन शिष्टाचारानुसार येथील लेखक म्हणाला, "बरोबर आहे तुमचे म्हणणे, तुमच्या खूप मोठ्या देशात थोडी माणसे खूप उंच होती. आमच्या देशात प्रत्येक लहान माणूस थोडा थोडा उंच व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे." तात्पर्य, प्रत्येक सामान्य माणूस थोडा थोडा उंच होतो, तेव्हा सर्व समाजाची प्रत सुधारते, हे सगळं कळतं, पण वळत नाही, त्याला काय करायचे?<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / १२३}}</noinclude>
otci1qmhdcfheu0ufxe8sh7u8lkj2e2
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/१२५
104
113065
238895
238893
2026-11-11T11:19:49Z
JayashreeVI
4058
238895
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''तारुण्य : तेव्हा आणि आता...!'''}}}}
{{gap}}''''ही''' असली फडकी गुंडाळून हिंडायला लाज नाही वाटत तुम्हाला! बापाला भीक लागली नाही तुमच्या अजून ! चार वार जास्त मोठं लुगडं विकत घ्यायची ऐपत आहे अजून!... जरा लेकीला समजवून सांगा तुमच्या. (हे अर्थात लेकीच्या आईला उद्देशून वडिलांचे उद्गार!)

{{gap}}'अग पण आई, वर्गातल्या सगळ्या मुली हल्ली पाचवारीच नेसतात. परवा नव्या आलेल्या लिमयेबाईसुद्धा पाचवारीच...'

{{gap}}'अगं पण तुझ्या बाबांना आवडत नाही तर नाही नेसू..'

{{gap}}'अं... मी नाही हं असलं काही ऐकणार...!' मग आठ-दहा दिवस धुसफूस वडिलांचा एकूणच माय-लेकींशी अबोला.... गाडं पूर्ववत्. मधल्या काळात वाड्यात नवीन साडी नेसू लागलेल्या म्हणजे तेरावं सरत आलेल्या आणखी दोघी-चौघी पाचवारी नेसून 'शेपटे फलकारीत' (ही म्हातान्या बायकांनी केलेली खास तारीफ!) हिंडू लागल्या आणि दोन-तीन वर्षांत मी साडी नेसायच्या अवस्थेला येईपर्यंत असले वाद मनातसुद्धा न येण्याइतकी पाचवारी साडी रूळली.

{{gap}}हा प्रसंग फार जुना नाही. नाटकातला तर नाहीच. चाळीस एक वर्षांपूर्वी आमच्या पुण्याच्या वाड्यात घडलेला हा प्रसंग ! माझ्या आत्याच्या मैत्रिणीच्या घरातला. माझ्या आत्याचं तेव्हा लग्न व्हायचं होतं. ती चांगली 'सतरा वर्षांची घोडनवरी' झालीय असे शेरे ज्येष्ठ बायका जाता-येता मारीत.

{{gap}}आता या पार्श्वभूमीवर परवा परवाचा एक प्रसंग! शहरात मिसळू पाहत असलेल्या खेड्यातली कॉलेजमध्ये शिकणारी एक विद्यार्थिनी ! सकाळी पहिल्या तासाला पाहिलं तर साडी नेसलेली. मधल्या सुटीनंतर पंजाबी सलवार खमीसमध्ये ! पुन्हा कॉलेजातून परत जाताना साडी ! हा काय विविध पोशाख स्पर्धेचा प्रकार ! म्हणून कुतूहलानं तिला विचारलं, तर उत्तर मिळालं,<noinclude>{{center|</noinclude>
jz4vcni40pe3fpsfh4irbe0ndver7cy