विकिबुक्स
mrwikibooks
https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.39.0-wmf.25
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिबुक्स
विकिबुक्स चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Gadget
Gadget talk
Gadget definition
Gadget definition talk
ग्रंथालयशास्त्र
0
2709
13176
5422
2022-08-20T14:45:35Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:ग्रंथालय शास्त्र]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
== शिक्षण आणि पात्रता ==
आधुनिक शिक्षणात आधुनिक ग्रंथालय व माहिती शास्त्रज्ञास [[संगणक]]; तसेच आंतरजालाचा योग्य वापर , ग्रंथालयातील कामकाजासाठी योग्य संगणक प्रणाली वापरणे या तांत्रिक कौशल्यांबरोबरच वाचकांच्या माहितीच्या बदलत्या व गुंतागुंतीच्या गरजांचा मानसशास्त्रीय अभ्यास करून माहितीचे संकलन व विश्लेषण करून ती तत्काळ पुरविणे ही कौशल्ये महत्त्वाची मानली जातात.
या मध्ये बी.लिब. एस्सी. व एम.लिब.एस्सी. असे अभ्यासक्रम आहेत. ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स कोर्स) पारंगत होण्यासाठी कमीत कमी पदवीधर असणे आवश्यक असते. या नंतर ग्रंथालय शास्त्र (लायब्ररी सायन्स)चा एका वर्षाचा कोर्स करून मास्टर कोर्स करता येतो. त्यानंतर आवडीनुसार उच्च शिक्षण पीएचडी किंवा एमफील घेता येते. यामध्ये डिप्लोमा आणि सटिर्फिकेट कोसेर्सही उपलब्ध असतात. यामध्ये लायब्ररी सिस्टिम मॅनेजमेण्ट, वगीर्करण पद्धती, बिबिलिओग्राफी, डॉक्युमेण्टेशन अशा गोष्टी शिकवल्या जातात.
===पुणे विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रम===
{{जाहिरात}}
पुणे विद्यापीठातील हा पदव्युत्तर अभ्यासक्रम हा एक इंग्रजी माध्यमातील अभ्यासक्रम आहे. हा चार सत्रात पूर्न होतो. त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे.
==== स्वरूप====
'''सत्र पहिले'''
* ग्रंथालये- इतिहास व प्रकार.
* ग्रंथालयशास्त्री मूलतत्वे- संप्रेषणाची या शास्त्रातील महत्त्व
* माहितीशास्त्र- आंतरविद्याशाखीय स्वरूप.
* माहितीचे स्रोत व वाचकांच्या गरजांचा अभ्यास
* संगणकशास्त्र- संगणकाची व इंटरनेटची ओळख, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर.
* ग्रंथालयाचे विविध विभाग व त्यांचे व्यवस्थापन या खेरीज प्रथम सत्रात इंग्रजी संवाद कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर दिला जातो.
'''सत्र दुसरे'''
* ज्ञान साधनांचे वर्गीकरण व तालिकीकरण
(तात्विक व प्रात्यक्षिक)
* संदर्भ सेवा- विविध संदर्भ साधने व त्यांचा प्रत्यक्ष वापर
* माहिती केंद्रे व संस्था
* माहिती / ज्ञानाचे व्यवस्थापन व धोरण
* ग्रंथालयांचे संगणकीय जाळे (ङळलीरीू पशीुींज्ञी)
'''सत्र तिसरे'''
* संशोधन- प्रकार व पद्धती
* ग्रंथालय व माहितीशास्त्रातील आधुनिक संशोधन तंत्रे
* ग्रंथालयाचे संगणकीकरण
* इंटरनेटवरून माहिती शोधण्याची आधुनिक तंत्रे व कौशल्ये
* डिजिटल ग्रंथालये, कंटेंट मॅनेजमेंट, वेब पेज डिझाइनिंग इ.
'''सत्र चौथे'''
* माहितीचे परिप्रेषण, इंडेक्सिंग, अब्स्ट्रक्टिंग, शब्दकुलकोश
* आधुनिक ग्रंथालये / माहिती केंद्राचे व्यवस्थापन व्यवस्थापनाची मूलतत्वे, प्लानिंग, बजेटिंग, मार्केटिंग, मनुष्यबळ विकास इ.
* व्यवस्थापनाची आधुनिक तंत्रे-
* मॅनेजमेंट ऑफ चेंज, टीक्यूएम, सिक्स सिग्मा इ.
* पूर्व अभ्यासित ज्ञानाचा यथोचित वापर करून प्रकल्प / शोधनिबंध.
* या व्यतिरिक्त विविध माहिती प्रणाली, मल्टी मीडिया विकसन, ग्रंथालय व माहितीशास्त्रासाठी प्रशिक्षित शिक्षक विकसन यापैकी एक वैकल्पिक विषय.
[[वर्ग:ग्रंथालय शास्त्र]]
g0gezgquerkmxpmtuxjudyokljpop1x
रामदासांचे अभंग
0
3137
13174
7172
2022-08-20T14:43:25Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:संत रामदास]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
==अभंग==
'''अभंग १'''
समुदाय काय सांगों श्रीरामाचा l अंतरी कामाचा लेश नाही
लेश नाही तया बंधु भरतासी l सर्वही राज्यासी त्यागियेले
त्यागियेले अन्न केले उपोषण l धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी
ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक lश्रीरामी सार्थक जन्म केला
जन्म केला धन्य वाल्मीकी ऋषीने lधन्य ती वचने भविष्याची
भविष्य पाहता धन्य बिभीषण राघवी शरण सर्व भावे
सर्व भावे सर्व शरण वानर धन्य ते अवतार विबुधांचे
विबुधां मंडण राम सर्व गुण अनन्य शरण रामदास
'''भावार्थ--''' या अभंगात संत रामदास श्रीरामांच्या निकटवर्तीय समुदाया विषयी बोलत आहेत.राम जेष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार नाकारला जातो हा मोठा अन्याय आहे असे भरताला वाटते.व तो राज्य पदाचा त्याग करतो. असा निष्काम भरत, राजवाड्यातील सर्व सुखांचा ,पत्नीचा त्याग करुन रामांबरोबर वनवासात जाणारा व १४वर्षे अन्नत्याग करून उपोषण करणारा लक्ष्मण,सेवेसाठी सदैव तत्पर असणारा व जन्म सार्थकी लावणारा मारुती, भविष्याचा वेध घेऊन रामचरित्र रचणारे प्रतिभाशाली कवी वाल्मिकी ,भविष्यावर श्रध्दा ठेवून राघवाला शरण जाणारा रावणबंधू बिभिषण,सर्वभावे रामाला शरण जाणारी वानरसेना,ह्या सर्व ईश्र्वराच्या विभुती असून मी त्यांना अनन्य भावे शरण जातो असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग २ .'''
काळ जातो क्षणक्षणा मूळ येईल मरणा
कांहीं धावाधाव करी ,जंव तो आहे काळ दूरी
मायाजाळी गूंतले मन, परि हे दुःखासी कारण
सत्य वाटते सकळ, परि हे जाता नाही वेळ
रामीरामदास म्हणे, आता सावधान होणें.
'''भावार्थ --'''-काळ प्रत्येक क्षणी पुढे जात आ मूळ केंव्हा
येईल हे सांगता येत नाही.जोवर काळ दूर आहे तोवरच प्रयत्न केले पाहिजेत.संसाराचे मायाजाल हेच दुःखाचे कारण आहे.संसार सत्य वाटत असला तरी तो क्षणभंगूर आहे.रामदास संसाराच्या अनित्यते बद्दल साधकालासावधानतेचा इशारा देत आहेत .व संसाराच्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी धावाधाव करण्यास सांगत आहेत.
'''अभंग ३'''
ऐसा हा मत्सर लागलासे पाठीं ।देवा तुझी भेटी केंवि घडे
भिन्न उपासना भिन्न संप्रदाव ।एकमेकां सर्व निंदिताती
पंडितां पंडितां विवाद लागला ।पुराणिकां जाला कलह थोर
वैदिकां वैदिक भांडती निकुरें । योगी परस्परें भांडताती
स्वजाति विजाति भांडण लागलें ।दास म्हणे केलें अभिमानें
'''भावार्थ --'''--या अभंगात समर्थ रामदास संप्रदायातील मत भिन्नतेबद्दल भाष्य करीत आहेत.येथे भिन्न भिन्न उपासना.भिन्न भिन्न संप्रदाय आहेत.मत्सरापोटी ते एकमेकांची निंदा करतात.पंडितां पंडितां मध्ये पराकोटीचे वादविवाद लागतात.पुराणिकांमध्ये घोर कलह (भांडण ) माजतात.वेद जाणणाय्रा वैदिकांमध्दे निकराचे मतभेद माजतात.योगी परस्परविरोधी बनून वाद घालतात. हे पाहून समर्थ रामदासांना अत्यंत खेद होतो कारण हे सर्व केवळ अभिमानाने घडून येते पण त्याचा परिणाम असा होतो की, भक्त देवाच्या भेटीस पारखा होतो. आपणास देवाची भेटी केंव्ह घडेल असे वाटून तो काकुळतीस येतो.
'''अभंग ४'''
देह हे असार क्रुमींचें कोठार ।परी येणे सार पाविजे तें
देहसंगे घडे संसारयातना । परी हा भजना मूळ देही
देहाचेनि संगे हिंपुटी होईजे ।विचारें पाविजे मोक्षपद
देहसंगें भोग देहसंगे रोग ।देहसंगे योग साधनांचा
देहसंगे गती रामदासीं जाली ।संगति जोडली राघवाची
'''भावार्थ ---''' या अभंगात समर्थ रामदास अध्यात्मिक द्रुष्टीकोनातून मानवी देहाचे महत्त्व पटवून देत आहेत.
देह हा असार (विनाशी ) असून अनेक प्रकारच्या रोगजंतुंचे भांडार आहे.।परंतू या असार देहाचा उपयीग करूनच आपण अविनाशी म्हणजे आत्म तत्वापर्यंत पोहचू शकतो.या देहामुळे संसारात अनेक यातना.शारिरीक व मानसिक दु:खे भोगावी लागतात तरिही देवाचे भजन याच देहामुळे शक्य होते. देहाच्या नश्वरतेमुळे निराश होण्यपेक्षा सारासार विचार करून मोक्षपदाला आपण पोहचू शकतो अशी ग्वाही समर्थ रामदास देत आहेत. देहासंगामुळे अनेक रोग जडतात अनेक भोग भोगावे लागतात, पण या देहामुळेच साधनेचा योग घडतो.या देहामुळेच समर्थांना रामदास म्हणवून घेण्याचे भाग्य प्राप्त झाले.त्यांना राघवाच्या संगतीचा लाभ झाला.असे श्री समर्थ म्हणतात.
'''अभंग ५'''
अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला
नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्म आचार
देहबुध्दी अनर्गळ । बोधे फिटला विटाळ
रामदासी ज्ञान झाले आणि स्वधर्मा रक्षिलें
'''भावार्थ-'''-या अभंगात संत रामदास नित्य व अनित्य गोष्टींचा विचार करण्यास सांगत आहेत.अनित्य (क्षणभंगुर) गोष्टींचा निरास करुन मनतील भ्रम दूर करावा असे ते सांगतात.त्यामुळे आपण नित्यानित्य विचार करुन देहबुध्दीचा त्याग करु शकतो.स्वधर्माचे आचरण करण्यासाठी शुध्द नित्यनेमाने आत्मबोध होतो. या आत्मबोधामुळे सोवळे,ओवळे ,विटाळ या भ्रामक कल्पना गळून पडतात .संत रामदास म्हणतात की, आपणास असे ज्ञान झाल्या मुळेच आपण स्वधर्माचे रक्षण करु शकलो.
'''अभंग ६'''
घात करुनी आपला । काय रडशील पुढिलां
बहुत मोलाचें आयुष्य ।विषयलोभें केला नाश
नाही ओळखिलें सत्या ।तेणें केली ब्रह्महत्या
रामीरामदास म्हणे । भुलों नको मूर्खपणे
'''भावार्थ--'''-केवळ विषय,वासनांच्या लोभामुळे आपण आपले सर्व आयुष्य वाया घालवतो. विषयलोभामुळे आयुष्याचा नाश झाल्यावर पुढे कितीही दु:ख केले ,कितीहि रडलो तरी त्याचा काही उपयोग होत नसतो असे सांगून संत रामदास आपणच आपला घात करू नये असा उपदेश करीत आहेत.जो सत्य ओळखू शकत नाहीं तो एकप्रकारे ब्रह्महत्या च करत असतो .मूर्खपणाने सत्य असत्य ओळखण्यात चुक करु नये असा सावधगिरीचा सल्ला ते आपल्याला देत आहेत.
'''अभंग ७'''
धातुवरी आला मळ । तेणें लोपलें निर्मळ
शेतीं न जाता आउत । तेणें आच्छादिले शेत
मुखे न होतां उच्चार ।तेणे बुडें पाठांतर
नाहीं दिवसाचा विचार ।दास म्हणे अंधकार
'''भावार्थ--'''-कोणत्याही धातूचा काही दिवस वापर न केल्यास त्यावर गंज चढतो. गंजामुळे धातूची निर्मलता लोप पावते. शेतात बरेच दिवस आउत घातले नाही ,शेताची मशागत केली नाही तर तण वाढून सर्व शेत आच्छादून टाकते. पाठ केलेल्या पाठांतराची रोज उजळणी न केल्यास आपण ते विसरून जातो. दिवस उजाडला आहे असा विचार न करता झोपून राहिलो तर संत रामदास म्हणतात की,सगळीकडे अंधारच दिसेतो.
'''अभंग ८'''
ऐसा कैसा रे परमार्थ । जळो जळो जिणें व्यर्थ
युक्ताहार करवेना । निद्रा आली धरवेना
मन चंचळ आवरेना । नीच उत्तर साहवेना
रामदास म्हणे भावे ।स्थूल क्रियेस नब जावे
'''भावार्थ--'''-शरिराला पोषक असलेला योग्य आहार जो घेत नाही ,झोप आली असता जो आवरू शकत नाही ,आपल्या चंचल मनावर जो संयम ठेवू शकत नाही तसेच इतरांनी केलेली निंदानालस्ती, अपशब्द जो सहन करू शकत नाही .अशा अत्यंत स्थूल गोष्टींवर जो मात करु शकत नाही तो परमार्थ साध्य करु शकणार नाही अशा माणसाचे जिणें व्यर्थ आहे असे संत रामदास मनापासून सांगत आहेत.
'''अभंग ९'''
वैद्य भेटला सुखदाता । रोगपालट जाला आतां
रस ओतीला कानांत । येउनि झोंबला नयनांत
रस भरला सांदोसांदीं । देही पालट जाली बुध्दि
दिव्य देही ओतिला रस । गुरु न्याहाळी रामदास
'''भावार्थ--'''-या अभंगात वैद्य रुपात सद्गुरू भेटल्यावर दे हात आणि मनात कसे परिवर्तन घडून येते याचे अत्यंत सुरेख वर्णन समर्थ रामदास करीत आहेत.एखादा निष्णात वैद्य भेटताच रोगपालट होतो .हा सुखदाता वैद्य म्हणजे सद्गुरु जो देहबुध्दीतच आमुलाग्र बदल घडवून आणतो.भक्तीचा प्रेमरस कानात ओतल्यावर तो डोळ्यात येऊन उतरतो आणि जगाचे स्वरूपच बदलून जाते. देहबुध्दि
लुप्त होऊन सर्वत्र आत्मस्वरुप भरून राहते.हा दिव्यरस
देहाच्या कणाकणात झिरपून भवरोग समूळ नाहिसा करतो,
मन सुखावते.आपल्या या सद्गुरुला संत रामदास डोळे भरुन पाहतात.
'''अभंग 10'''
प्रव्रुत्ति सासुर निव्रूत्ति माहेर ।तेथे निरंतर मन माझे
माझे मनी सदा माहेर तुटेना ।सासुर सुटेना काय करुं
काय करूं मज लागला लौकिक ।तेणें हा विवेक दुरी जाय
दुरी जाय हित मज चि देखतां ।यत्न करूं जातां होत नाहीं
होत नाहीं यत्न संतसंगेविण । रामदास खुण सांगतसे
'''भावार्थ'''-संत रामदास या अभ़ंगात म्हणतात की, निव्रुती हे माझे माहेर असून तेथे माझे मन ओढले जाते.मनातून माहेरची आठवण जात नाही .परंतु प्रव्रूत्ति हे सासर असून त्या पासून सुटका करून घेता येत नाही .लौकिकाला टाळता येत नाही. त्यामुळे मनात निव्रूत्तिचा विवेक टिकवून धरता येत नाही.प्रयत्न करुनही मन या निव्रूत्ति च्या मार्गाने पुढे जात नाही. माझ्या डोळ्यांदेखत माझे हित दूर जात आहे.मनाच्या या द्विधा अवस्थेत असताना सुध्दा संत रामदासांचे विचारी मन अवस्थेतून सुटण्यासाठी प्रयत्न करते आणि संतसंगति शिवाय कोणतेही प्रयत्न सफल होणार नाहीत अशी ग्वाही देते.संतसंगति हीच निव्रुती मार्गाची खूण आहे असे संत रामदास स्पष्टपणे सांगतात.
'''अभंग 11'''
ईंद्रासी उद्वेग सर्वकाळ मनीं । माझे राज्य कोणी घेईना कीं
घेईना कीं कोणी बळिया दानव । घालिना कीं देव कारागृहीं
कारागृह देवादिकांचे चुकेना । तेथे काय जनां चुकईल
चुकईल भोग हें कईं घडावें । लागेल भोगावें केलें कर्म
केले कर्म तुटे जरी भ्रांति फिटे ।दास म्हणे भेटे संतजन
'''भावार्थ-'''या अभंगात संत रामदास कर्मभोग आणि त्याचे परिणाम या विषयाची चर्चा करीत आहेत. त्या साठी ते इंद्राचे उदाहरण देतात. आपले राज्य कोणी तरी बळकावून बसेल असे वाटत असल्याने त्याच्या मनात नेहमीच उद्विग्नता असतं.एखादा बलवान दानव सर्व देवांना काराग्रुहात डांबून इंद्रपद मिळवून बसेल अशी भिती त्याला वाटते.संत रामदास म्हणतात की,देवादिकांना सुध्दा तुरंगवास चुकला नाही तर तो माणसाला कसा चुकणार?सुखदु:खाचे भोग माणसला कदापीही चुकवता येणार नाहीत. आपण जसे कर्म करू तसे भोग आपल्याला भोगावे लागणार असा कर्मसिध्दांत आहे. केलेल्या कर्माचे भोग भोगून संपवल्या नंतरच मनाची भ्रांती फिटते असे स्पष्ट मत येथे संत रामदासांनी व्यक्त केले आहे.ते पुढे असेही म्हणतात की,संतजन भेटल्यावरच ही प्रक्रिया घडून येते.
'''अभंग १२'''
तेचि जाणावे सज्जन ।जयां शुध्द ब्रह्मज्ञान
कर्म करिंती आवडी । फळाशेची नाही गोडी
शांति क्षमा आणि दया । सर्व सख्य माने जया
हरिकथा निरुपण । सदा श्रवण मनन
बोलासारिखें चालणें । हींचि संतांचीं लक्षणें
एकनिष्ठ उपासना । अतितत्पर भजना
स्वार्थ सांडूनियां देणें ।नित्य तेंचि संपादणें
म्हणे रामीरामदास । जया नाहीं आशापाश
'''भावार्थ''' -अभंगात संत रामदास सज्जनांची लक्षणे सांगत आहेत.त्यांना शुध्द ब्रह्मज्ञान असते.कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करण्याची आवड असते.शांती,क्षमा व दया या विषेश गुणांविषयी त्यांना अत्यंत आस्था असते , हरिकथेचे निरूपण ,सतत,श्रवण व मनन करणे ह्यांची आवड असते.संत नेहमीच जसे बोलतात तसेच वागतात.एकनिष्ठपणे उपासना करणे,देवाचे भजनात तत्परता असणे,अत्यंतिक नि:स्वार्थीपणा कोणताही आशपाश नसणे.सतत नित्य वस्तु म्हणजे परमेश्वराची उपासना करणे ही संत सज्जनांची लक्षणें आहेत हे संत रामदास सांगतात.
'''अभंग १३'''
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी ।नि:संदेह मनी सर्वकाळ
आवडीने करी कर्म-उपासना ।सर्वकाळ ध्यानारूढ मन
पदार्थांची हानी होतां नये काही ।जयाची करणी बोलाऐसी
दास म्हणे धन्य सर्वांसी जो मान्य । जयाचा अनन्य समुदाव
'''भावार्थ'''-संत रामदास या अभंगात म्हणतात की,जो मनाने पूर्ण समाधानी असून नि:संदेह असतो तो खरा ज्ञानी असतो.तो आवडीने कर्म उपासनेत रमतो ,तोए सर्वकाळ इश्वर चिंतनात मग्न असतो. ज्ञानी संतांकडुन केव्हाही कोणत्याही पदार्थाची हानी होत नाही.ते नहमीच जसे बोलतात तसेच वागतात.ज्यांचा जन-समुदाय खूप मोठा असतो.असे संत सज्ज्न खरोखर धन्य होत.
'''अभंग १४'''
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधू ।भूतांचा विरोधू जेथ नाही
कल्पनेचा देहो त्या नाही संदेहो ।सदा नि:संदेह देहातीत
जया नाही क्रोध जया नाही खेद ।जया नाही बोध कांचनाचा
रामदास म्हणे साधूची लक्षणें । अति सुलक्षणें अभ्यासावी
'''भावार्थ-'''ज्याला नित्य वस्तूचा पूर्ण बोध झाला आहे तो खरा साधु असे समजावे.अशा साधुच्या मनात कोणत्याही प्राणिमात्रांच्या विषयी आकस नसतो.असे साधु केवळ आत्मरूप असतात.ते नेहमी नि:संदेह असून देहातीत असतात.ते राग,लोभ,दु:ख यांच्या पलिकडे असतात.त्यांना धन,कांचनाचा अजिबात मोह नसतो. संत रामदास म्हणतात ही खऱ्या साधुची लक्षणे असून ती मनापासून अभ्यासावी.
'''अभंग १५'''
बोलण्यासारिखे चाले जो सज्जन ।तेथें माझे मन विगुंतलें
नाही अभिमान शुध्द ब्रह्मज्ञान ।तेथे माझे मन विगुंतले
व्रुत्ति उदासीन स्वधर्मरक्षण ।तेथे माझे मन विगुंतलें
पूर्ण समाधान सगुण भजन ।तेथे माझे मन विगुंतलें
दास म्हणे जन भावार्थ संपन्न।तेथे माझे मन विगुंतलें
'''भावार्थ'''-
जो सज्जन बोलण्या प्रमाणे वागतो तशी क्रुती करतो,शुध्द ब्रह्मज्ञानी असूनही ज्या सज्जनांना अभिमानाची बाधा नसते, नेहमी उदासिन व्रुत्तिने राहून जे धर्म रक्षणासाठी सतत प्रयत्न करतात, पूर्ण समाधानी असून जे आनंदाने सगुणाची उपासना करतात,अशा संताच्या ठिकाणी आपले मन गूंतून राहिले आहे असे संत रामदास या अभंगात सांगतात.शेवटच्या ओळीत तर ते असे म्हणतात की,जे सामान्य जन भावार्थ संपन्न असून भक्तीपुर्ण अंतकरणाने देवाला आळवतात तेथेही आपले मन गुंतून पडते.
'''अभंग १६'''
धन्य ते भाविक वंदिती हरिदास ।तयां ह्रषीकेश वंदितसे
धन्य तें निंदक निंदिती सज्जन ।येणें भावें घडे ध्यान त्यांचें
धन्य दास दासी सज्जन सेवेसी ।ते सुरवरांसी वंद्य होती
'''भावार्थ'''-रामदास म्हणे तरीच धन्य होणें। जरी संग लाधणे सज्जनाचाभावार्थ
संत रामदास म्हणतात की, ते भाविक धन्य होत की जे हरिदासांना वंदन करतात . पुढे ते असेही म्हणतात की,जे सज्जनांची निंदा करतात ते निंदक सुध्दा धन्य होत कारण निंदा करण्यासाठी का होईना पण त्यांना सज्जनांचे ध्यान घडते.जे दासदासी सज्जनांची सेवा करतात ते धन्य होत कारण सुरवरच नव्हे तर प्रत्यक्ष ह्रषीकेशी त्यांना वंदन करतात. संत रामदास स्पष्टपणे सांगतात की, सज्जनांची संगति सहवास मिळणे यांतच जिवनाची खरी धन्यता आहे.
'''अभंग १७'''
जाणावा तो नर देवचि साचार । वाचे निरंतर रामनाम
सगुणी सद्भाव नाही ज्ञानगर्व ।तयालागी सर्व सारखेचि
निंदकां वंदकां संकटी सांभाळी ।मन सर्वकाळी पालटेना
पालटेना मन परस्त्रीकांचनी ।निववी वचनी पुढिलांसीं पुढिलांसी नाना सुखें देत आहे ।उपकारीं देह लावितसे
लावितसे देह राम भजनासी ।रामीरामदासीं रामभक्त
'''भावार्थ-'''जो वाचेने सतत रामनामाचा जप करीत असतो तो पुरूष देवाचे रुप आहे असे समजावे असे स्षट करुन संत रामदास म्हणतात की,त्यांना सगुण भक्ती आवडते.त्यांच्या ठिकाणी अपपर भाव नसतो. ते सर्वांना सारखेच मानतात.ते पूर्ण ज्ञानी असतात पण त्यांना त्याचा गर्व नसतो.ते मनाने स्थिर असून आपली निंदा किंवा वंदना करणाऱ्या सर्वांना ते संकटात सांभाळतात. ते स्थिरबुध्दी असून स्त्री आणि कांचन यांचा मोह त्यांना पडत नाही.ते केवळ शब्दांनी समोरच्याचे मन शांत करतात,त्यांना नाना सुखें देतात आणि आपला देह परोपकारा करिता खर्च करतात.ते आपला देह रामभजनात झिजवतात.संत रामदास म्हणतात की, रामाचे दास असलेले ते खरे रामभक्त असतात.
'''अभंग १८'''
देव अभक्तां चोरला ।आम्हां भक्तां सांपडला
भेटीं जाली सावकाश ।भक्ता न लागती सायास
पुढे विवेक वेत्र-पाणी ।वारी द्रुश्याची दाटणी
रामदासाचे अंतर । देवापाशी निरंतर
'''भावार्थ'''-जे देवापासून विभक्त आहेत अशा अभक्तानीं देव चोरून नेला आहे.परंतू तो आम्हा भक्तांना सापडला आहे कारण
प्रेमळ भक्तांना देव शोधून काढण्यासाठी काहीच सायास करावे लागत नाहीत, ते अनायासे देवाची सावकाश भेट
घेऊ शकतात.संत रामदास सांगतात की,रामदासांचे मन निरंतर, सदासर्वकाळ रामापाशी गुंतलेले असते.
'''अभंग १९'''
ऐसा कोण संत जो दावी अनंत ।संदेहाचा घात करुं जाणे
आढळेना जया आपुले पारिखें ।ऐक्यरूप सुखें सुखावला
धन्य तेचि जनीं जें गुणें बोधिले ।दास म्हणे जाले पुरुष ते
'''भावार्थ'''-संत रामदास म्हणतात , असा कोण संत आहे की , जो
मनातील सर्व शंकांचे निरसन करुन प्रत्यक्ष अनंताचे दर्शन
घडवू शकतो.तो असा संत असतो की, ज्याला आपल्या वेगळे असे कोणी दिसतच नाही . तो ऐक्यभावाने जगातील
सर्वाशी पूर्णपणे एकरुप झालेला असतो त्यामुळें तो पूर्ण
सुखात असतो.सगुण भक्तीने जे अशा प्रकारे सामान्य जनांशी बांधले गेले आहेत ते भाग्याचे पुरुष होत.
'''अभंग २०'''
जंव तुज आहे देहाचा संबंध । तंव नव्हे बोध राघवाचा
राघवाचा बोध या देहावेगळा।देह कळवळा तेथें नाही
नांदतसे सदा जवळी कळेना ।कदा आकळेना साधुविण
कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण । रामदास खूण सांगतसे
'''भावार्थ'''-या अभंगात संत रामदास स्पष्टपणे सांगत आहेत की, जो
पर्यंत देहसंग असतो तो पर्यंत राघवाचा बोध होत नाही कारण राघवाचा बोध देहातीत असतो.देहाविषयी मोह ,ममत्व असेल तो पर्यंत राघवाचा लाभ होणार नाही.तो सतत आपल्या निकट असूनही त्याचे स्वरुप आपल्याला सत्संगाशिवाय समजू शकत नाही. राघवाचे स्वरूप समजण्यासाठी संतांना शरण जाणे हाच केवळ एकमेव मार्ग आहे .ही खूण संत रामदास सांगत आहेत.
'''अभंग २१'''
पाहतां दिसेना तेंचि बरें पाहे ।तेथें रुप आहे राघवाचें
निराकार राम देखतां विश्राम ।दुरी ठाके श्रम संसारींचा
सर्वकाळ रामदर्शन होतसे ।निर्गुणीं विश्वासें मन माझें
संतसंगें घडे नि:संगाचा संग।राघवाचा योग रामदासीं
'''भावार्थ'''
साध्या चर्मचक्षुंनी जे दिसत नाही ते पाहण्याचा प्रयत्न केल्यास तेथेच राघवाचै रुप आहे.अशा निराकार रामाला पाहताच मनाला विश्राम मिळतो.संसारातील सर्व श्रम दूर निघून जातात.सर्व ठिकाणी सर्वकाळी केवळ रामच भरून राहिला आहे याची ष्रचिती येते व अशा रितीने रामदासांना रामाचा योग जुळून येतो.
'''अभंग 22'''
देव जवळी अंतरीं ।भेटिं नाहीं जन्मवरी
भाग्यें आलें संतजन ।जालें देवाचे दर्शन
मूर्ति त्रैलोक्यीं संचली ।द़ष्टि विश्वाची चुकली
रामदासीं योग जाला ।देहीं देव प्रगटला
'''भावार्थ'''
देव अगदी आपल्या जवळ असतो,आपल्या अंतरी असतो पण जन्मभर त्याची भेट घडत नाही. एकदा भाग्य फळाला आले आणि संतांची भेट घडली,त्यांच्या मुळे देवाचे दर्शन झाले. देव स्वर्ग ,प़ुथ्वी,पाताळ असा त्रैलोकी भरुन राहिला आहे पण जगाच्या नजर चुकीमुळे देवाचे दर्शन घडत नाही असे। सांगून संत रामदास म्हणतात की,रामाचा दास बनण्याचा योग आला आणि रामदासांच्या देहात देव प्रगट झाला.
'''अभंग २३'''
आम्ही अपराधी अपराधी ।आम्हां नाही द्ढ बुध्दि
माझे अन्याय अगणित ।कोण करील गणित
मज सर्वस्वे पाळिलें । प्रचितीने संभाळिलें
माझी वाईट करणी ।रामदास लोटांगणीं
'''भावार्थ'''
या अभंगात संत रामदासांची अपराधीपणाची भावना व्यक्त झाली आहे.आपल्याला निश्चयी बुध्दी नाही,ज्यांचे मोजमाप करता येणार नाही असे अगणित अन्याय घडले आहेत.वाईट करणी असूनही राघवाने सर्वस्वाने पालन केले आहे,अनेक वेळा सांभाळले आहे.अशी प्रचिती आली आहे.असे प्रांजलपणे सांगून, संत रामदास राम चरणीं लोटांगण घालून ,आपल्या अपराधाबद्दल क्षमा मागत आहेत.
'''अभंग २४'''
पतितपावना जानकीजीवना ।वेगी माझ्या मना पालटावें
भक्तीची आवडी नाहीं निरंतर । कोरडे अंतर भावेविण
माझें मीतूपण गेलें नाहीं देवा । काय करु ठेवा संचिताचा
रामदास म्हणे पतिताचे उणे ।पतितपावनें सांभाळावें
'''भावार्थ'''
या अभंगात संत रामदास आपल्या मनात प्रभु रामचंद्राने वेगानं बदल घडवून आणावा अशी प्रार्थना करीत आहेत.आपले अंत:करण भक्तीभावाशिवाय अगदी कोरडे असून मनामध्ये निरंतर भक्तिची आवड निर्माण होत नाहीं.अहंकार, मीतूपणा यांनी मन ग्रासलेले आहे कारण पूर्व संचिताचा ठेवा भक्तिच्या आड येतो.संत रामदास म्हणतात की, पतितांच्या उणिवा लक्ष्यात घेवून पतितपावन श्री रामाने पतितांना पावन करावे, सांभाळावे.
'''अभंग २५'''
पतितपावना जानकीजीवना ।वेगीमाझ्या मना पालटावें
वैराग्याचा लेश नाहीं माझें अंगी ।बोलतसें जगीं शब्दज्ञान
देह हें कारणीं लावावें नावडे ।आळस आवडे सर्वकाळ
रामदास म्हणे लाज तुझी तुज ।कोण पुसे मज अनाथासी
'''भावार्थ'''
संत रामदास श्री रामाला प्रार्थना करतात की,त्यांनी आपले मन पालटून टाकावे.जगामध्ये कितीही शब्दज्ञान सांगत असलो तरी वैराग्याचा लवलेशही आपल्या अंगी नाही. देह सत्कारणी लावावा असे वाटत नाही. सदासर्वकाळ आळसच आवडतो.आपल्यातील हे सर्व दोष मान्य करून संत रामदास म्हणतात ,भक्तांचे हे सर्व दोष स्वामिंच्या स्वामीपणाला कमीपणा आणणारे आहेत कारण आम्हा अनाथांना या साठी कोणी विचारणार नाही.
'''अभंग २६'''
पतितपावना जानकीजीवना ।वेगीं माझ्या मना पालटावें
मन हे चंचळ न राहे निश्चळ ।निरुपणीं पळ स्थिरावेना
सांडुनियां ध्यान विषयचिंतन ।करितसे मन आवरेना
रामदास म्हणे कथा निरुपणे ।मनाची लक्षणे जैसीं तैसीं
'''भावार्थ'''
आपले मन हे अतिशय चंचल असून एक क्षणभरही शांत राहत नाही.धर्मग्रंथाच्या निरुपणात स्थिरावत नाही.ध्यान सोडून देऊन विषयांचे चिंतन करणाय्रा या मनाला कसे आवरावे हे समजत नाही.संत रामदास म्हणतात, कितीही कथा व निरूपणे ऐकली तरी मनाची लक्षणे बदलत नाही,जशीच्या तशीच राहतात.श्री रामाला शरण जावून ,या चंचल मनाला पुर्णपणे बदलवून टाकण्याची ते विनंति करतात.
'''अभंग २७'''
पतितपावना जानकीजीवना ।वेगी माझ्या मना पालटावें
मुखें बोले ज्ञान पोटीं अभिमान ।पाहे परन्यून सर्वकाळ
द्रुढ देहबुध्दी तेणें नाहीं शुध्दि ।जाहलों मी क्रोधी अनावर
रामदास म्हणे ऐसा मी अज्ञान ।सर्व ब्रह्मज्ञान बोलोनियां
'''भावार्थ'''
मुखाने ज्ञानाच्या कितिही गोष्टी बोलत असलो तरी मन मात्र अहंकाराने भरलेले आहे. हे मन सतत इतरांचे न्यून शोधत असते.देहबुध्दी इतकी घट्ट आहे की,अंतःकरणाची शुध्दि होत नाही.क्रोध अनावर होतो. संत रामदास म्हणतात सर्व ब्रह्मज्ञान बोलुनही अहंकार व क्रोध यांना जिंकू शकत नाही. श्री रामाने त्वरित अज्ञानी मनाला पालटून टाकावे अशी कळकळीची विनंति करतात.
'''अभंग २८'''
पतितपावना जानकीजीवना ।वेगीं माझ्या मना पालटावें
मिथ्या शब्दज्ञाने तुज अंतरलों।संदेहीं पडलों मीपणाचें
सदा खळखळ निर्गुणाची घडे ।सगुण नावडे ज्ञानगर्वे
रामदास म्हणे ऐसा मी पतित ।मीपणें अनंत पाहों जातां
'''भावार्थ'''
या अभंगात संत रामदास पतितपावन रघूनायकला आपले मन परिवर्तन घडवून आणावे अशी विनंति करीत आहेत.ते म्हणतात की, खोट्या शब्दज्ञानाच्या भोवर्यात सापडून मन साशंक बनले आहे.निर्गुण भक्तीची ओढ वाटु लागली आहे.ज्ञानाचा गर्व वाटु लागल्याने सगुण भक्ती आवडेनाशी झाली आहे.ज्ञानाच्या फसव्या अहंकाराने रामभक्तीला परखा झालो आहे,पतित बनलो आहे.
'''अभंग २९'''
बिभिषण भावें शरण आला परी ।तुज सिंधुतीरीं ऐकुनिया
तात्काळचि तुवां आश्वासिलें त्यासी।तैसें हें आम्हासीं कैचे रामा धारिष्ट आमुचें पाहे सर्वोत्तमा ।कलियुगींचे रामा दास तुझे दर्शन सुग्रीवा आधीं सौख्य दिले। मग तेणे केले दास्य तुझे तुजलागीं प्राण वेंचिलें वानरीं । परि तूं धनुर्धारी पाठीराखा
तुझे रुप द्रुष्टीं नसोनियां ठावें ।नामीं सर्वभावें विश्वासलों
सकळांहूनि साना रामदास जालों ।परिवारेंसि आलो शरण तुज
'''भावार्थ'''
श्री राम लंकेच्या समुद्र किनाऱ्यावर येवून पोहचले आहेत ही बातमी रावण बंधू बिभिषण याला समजताच तो अत्यंत भक्तिभावाने त्यांना शरण गेला आणि प्रभू रामचंद्रांनी तात्काळ त्याला आश्वासन दिले परंतू हे भाग्य आपल्या वाट्याला कसे येणार असे विचारुन संत रामदास म्हणातात की,ते कलियुगातील रामदास आहेत.श्री रामाने वानरपती सुग्रीवाला आधी दर्शन सौख्य दिले आणि नंतर त्याने प्रभुरामाचे दास्य पत्करले.वानरसेनेने रामांसाठी स्वता:चे प्राण खर्ची घातले पण त्यांना हे माहिती होते की प्रभू रामा सारखा धनुर्धारी त्यांच्या पाठिशी आहे.संत रामदास म्हणतात श्री रामांचे रूप नजरेला पडले नसतांना सुध्दां केवळ त्यांच्या नामावर विश्वास ठेऊन आपण सर्वभावे श्री रामांना शरण गेलो .बिभीषण, सुग्रीव व वानरसेना यांच्या पेक्षा लीन होऊन रामदास झालो आणि सर्व परिवारासह रामांना शरण गेलो.
'''अभंग ३०'''
रामा तुझ्या स्वामीपणे ।मानी ब्रह्मांड ठेंगणें
तुजविण कोण जाणे ।अंतर आमुचें
तुजविण मज माया। नाहीं नाहीं रामराया
आम्हां अनाथां कासयां ।उपेक्षिसी
तुज समुदाय दासांचा ।परि आम्हां स्वामी कैंचा
तुजसाठीं जिवलगाचा ।संग सोडिला
सगुण रघुनाथ मुद्दल ।माझें हेंचि भांडवल
'''भावार्थ'''
या अभंगात संत रामदास रामाची आळवणी करीत आहेत.रामाशिवाय दुसरे कुणी अंतरंगातील भावना जाणू शकत नाही.स्वामी रघुनाथा शिवाय मनापासून कुणावर माया कराविशी वाटत नाही. रामा सारखा स्वामी लाभल्यामुळे ब्रह्मांड मिळाल्या सारखे वाटते. असे असतांना श्री रामांनी आपल्या या एकनिष्ठ भक्तांची उपेक्षा करु नये अशी विनंति ते प्रभू रामचंद्रांना करतात.रामासाठी आपण अत्यंत जिवलग व्यक्तिंचा त्याग केला आहं.रामाची सगुण भक्ती हेच आपले एकमेव भांडवल आहे .रामांच्या सभोवताली दासांचा मोठा समुदाय आहे पण आम्हा भक्तांना श्री राम हे एकटेच स्वामी आहेत.रामांनी क्रुपा करुन या दासाला भव सागराच्या पार करावे अशी ईच्छा ते रामचरणी करीत आहेत.
'''अभंग ३१'''
माझा देह तुज देखतां पडावा ।आवडी हें जीवा फार होती
फार होती परी पुरली पाहतां ।चारी देह आतां हारपले
सिध्द जालें माझें मनीचें कल्पिले ।दास म्हणे आलें प्रत्ययासी
'''भावार्थ'''
संत रामदास म्हणतात की, रामासमक्ष आपला देह पडावा अशी मनापासून आपली अपेक्षा होती आणि ती पुरवली गेली हे पाहतांना त्यांचे स्थूल ,सूक्ष्म ,कारण व महाकारण असे चारी देह हारपले . रामदास म्हणतात आपल्या असे अनुभवास आले आहे की, आपण मनापासून जे कल्पिले होते ते सिध्दीस आले आहे.
'''अभंग ३२'''
काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा
काहीं धांवाधांव करी ।जंव तो आहे काळ दुरी
मायाजाळीं गुंतलें मन । परि हें दु:खासि कारण
सत्य वाटतें सकळ । परि हें जातां नाहीं वेळ
रामींरामदास म्हणें ।आतां सावधान होणें
'''भावार्थ'''-काळ क्षणाक्षणाला पुढे जात आहे,मरणाचे मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही. संसाराच्या माया जाळ्यात मन गुंतले आहे पण संसार हेंच दु:खाचे कारण आहे.नाशवंत संसार सत्य वाटतो परंतू त्याचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही,जो पर्यंत मरण काळ दूर आहे तो वरच सावधान होऊन मुक्ती साठी प्रयत्न केले पाहिजेत असा उपदेश संत रामदास करीत आहेत.
'''अभंग ३३'''
नदी मर्यादा सांडती ।उष्णकाळीं वोसावती
तैसा तारूण्याचा भर ।सवें होतसे उतार
भाग्य चढे लागवेगैं ।सवेंचि प्राणी भीक मागे
रामदास म्हणे काळ ।दोनी दिवस पर्वकाळ
'''भावार्थ'''- पावसाळ्यात नद्या पुराच्या पाण्यामुळे फोफावतात व किनारा सोडून वाहू लागतात,तर उन्हाळ्यात कोरड्या पडतात.संत रामदास म्हणतात तारुण्याचा भर नदीच्या पाण्यासारखा असतो,त्याला लवकरच उतार पडतो.माणसाचे भाग्य तसेच आहे.एकाएकी भाग्य उजळते आणि अचानक मावळते,माणसावर भीक मागण्याची वेळ येते.संत रामदास म्हणतात सतत बदलणाय्रा संसारात लाभ-हानी दोन्हीही पर्वकाळच समजावेत.
'''अभंग ३४'''
पुरें पट्टणें वसती । एक वेळ ओस होती
तैसे वैभव हें सकळ । येतां जातां नाहीं वेळ
बहुत स्रुष्टीची रचना । होय जाय क्षणक्षणा
दास म्हणे सांगों किती ।आले गेले चक्रवर्ती
'''भावार्थ'''-अनेक शहरे ,राजधान्या वसवल्या जातात पण एक वेळ अशी येते कीं,त्या ओस पडतात.तसेच सगळे वैभव येते आणि लयाला जाते त्याला वेळ लागत नाही.सर्व स्रुष्टीची रचना क्षणाक्षणाला होते आणि बदलते.संत रामदास म्हणतात कितीतरी चक्रवर्ती राजे आले आणि काळाच्या पडद्याआड नाहिसे झाले.
'''अभंग ३५'''
सांजे ओसरतां सांत ।वांया करावा आकांत
तैसीं सखीं जिवलगें ।जाती एकमेकांमागें
चारी दिवस यात्रा भरे ।सवेंचि मागुति ओसरे
पूर्ण होतां महोत्साव । फुटे अवघा समुदाव
बहू वह्राडी मिळाले ।जैसे आले तैसै गेले
एक येती एक जाती । नाना कौतुक पाहती
रामीरामदास म्हणे । संसारासी येणे जाणे
'''भावार्थ'''-संध्याकाळ होताच सूर्य अस्ताला जातो त्यासाठी शोक करणे व्यर्थ आहे तसेच आपले सगे,सोयरे ,,जिवलग एका पाठोपाठ आपल्याला सोडून निघून जातात.चार दिवस यात्रा भरते आणि हळूहळू ओसरते.एखादा मोठा उत्सव पूर्ण होतो आणि उत्सवाला आलेले सर्व लोक पांगतात.लग्न समारंभा साठी पुष्कळ वह्राडी जमतात ,आले तसे निघून जातात.काही येणाय्रा जाणाय्रांचे कौतुक पाहत असतात.संत रामदास म्हणतात या प्रमाणे संसारी येणे जाणे अटळ आहे.
'''अभंग ३६'''
एकीकडे आहे जन । एकीकडे ते सज्जन
पुढें विवेकें वर्तावे । मागे मूळ सांभाळावें
उदंड झाला समुदाय ।तरि आदि सांडू नये
रामीरामदास म्हणे । जनीं मान्य हें बोलणें
'''भावार्थ'''-संत रामदास म्हणतात ,सामान्य जन व सज्जन असे दोन प्रकारचे लोक पहावयास मिळतात. समाजात माणसाने विवेकाने वागावे,आपली मूळ परंपरा सोडू नये .आपल्याला जनमान्यता मिळून मोठा समुदाय सभोवती जमा झाला तरीही आपण ज्या गुरु परंपरेतून आलो आहे तिचा आदर राखून त्या प्रमाणेच वागावे,त्याला बाधा आणू नये असे मत संत रामदास या अभंगात व्यक्त करतात.
'''अभंग ३७'''
प्रपंच सांडुनिया बुध्दी । जडली परमार्थ उपाधि
मना होईं सावचित्त । त्याग करणें उचित
संप्रदाय समुदाव ।तेणें जडे अहंभाव
रामदास म्हणे नेमें । भिक्षा मागणें उत्तम
'''भावार्थ'''-प्रपंच सोडण्याची बुध्दी झाली, परमार्थाची उपाधि जडली
परंतू समुदाय गोळा झाला आणि संप्रदाय निर्माण झाला की अहंभाव जडतो.संत रामदास सांगतात की, अहंकार निर्मूलन होण्यासाठी भिक्षा मागणे हा मार्ग आहे.यासाठी सावध राहून अहंकाराचा त्याग करणे उचित आहे.
'''अभंग ३८'''
नको ओळखीच जन । आंगी जडे अभिमान
आतां तेथें जावें मना । जेथे कोणी ओळखेना
लोक म्हणती कोण आहे ।पुसों जाता सागों नये
रामदास म्हणे पाहीं ।तेथे कांहीं चिंता नाही
'''भावार्थ'''-ओळखीच्या लोकांमध्यै सतत राहिल्याने मनाला अभिमानाचा रोग जडतो. अशा वेळी अशा ठिकाणि निघून जावें की जेथें ओळखिचे लोक फारसे भेटणार नाहीत. जेंव्हा लोक आपण कोण असे विचारतील तेंव्हा ओळख सांगू नये. संत रामदास म्हणतात कीं, असे वागल्यास तेथे काहीं चिंता राहत नाही.
'''अभंग 3९'''
आम्ही मोक्ष लक्ष्मीवंत । भवदरिद्र कैंचें तेथ
श्रीपतीचे परिजन ।आम्ही स्वानंदसंपन्न
समाधान तें सभाग्य । असमाधान तें अभाग्य
रामीरामदासीं देव । सख्यासहित स्वानुभव
'''भावार्थ'''- या अभंगात संत रामदास आपण भाग्यवंत आहोत कारण मोक्षलक्ष्मी आपल्याला प्रसन्न आहे ,त्यामुळे संसारातील
दारिद्रय आमच्याकडे नाही. आपण स्वानंद संपन्न् आहोत
असे मोठ्या अभिमानाने सांगतात.समाधान हे सौभाग्य आणि असमाधान हेंच दारिद्र्य होय असे त्यांचे मत आहे.श्री राम हे रामदासांचे दैवत असून श्रीराम सौख्याचा त्यांना स्वानुभव आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
'''अभंग-४०'''
स्नान संध्या टिळेमाळा ।पोटीं क्रोधाचा उमाळा
एसें कैंसें रे सोंवळे। शिवतां होतसे ओंवळें
नित्य दंडितां हा देहो । परि फिटेना संदेहो
बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ
नित्यनेम खटाटोप । मनीं विषयाचा जप
रामदासीं द़ुढभाव । तेणेंविण सर्व वाव
'''भावार्थ''' - मनामध्ये खरा भक्तीभाव नसतांना केवळ बाहय उपचारांचे अवडंबर माजवणाय्रा दांभिक भक्तांवर टीका केली आहे.
संत रामदास म्हणतात ,नेहमी नियमितपणे स्नान संध्या करणारे, कपाळावर टिळे व गळ्यात माळा घालणाय्रांच्या मनात जर राग धुमसत असेल तर किंवा उपास तापास देहदंडना करुनही मनातील संशय फिटला नसेल ,बाहेरुन खूप खटाटोप करनही देहबुध्दी कायम असेल ,केवळ बाह्यतः उपासनेचा देखावा करीत मनात विषयाचा विचार करीत असेल ,सोवळ्या ओवळ्याच्या संकुचित कल्पनांवर
विश्वास असेल ,तर हे सर्व बाह्य उपचार निर्मळ भक्ती भावाशिवाय व्यर्थ होत असे स्पष्ट मत संत रामदास या अभंगात मांडत आहेत .
'''अभंग ४१'''
ब्रह्मादिक देव ब्रह्मज्ञानाआड । करिती पवाड विघ्नरुपें
यालागीं सगुणभावें उपासना । करिजे निर्गुणा पावावया
रामीरामदास विश्वासी सगुण । सगुणीं निर्गुण कळों आलें
'''भावार्थ'''-ब्रह्मा,विष्णू, महेश हे देव ब्रह्मज्ञानाआड विघ्न रूपाने अडथळे आणतात.संत रामदास म्हणतात, यासाठी निर्गुणाची उपासना करण्यापूर्वी आधी सगुणाची उपासना करावी. श्री रामाच्या सगुण रूपावर उदंड विश्वास असल्याने आपणास सगुण निर्गुण दोन्हीही कळून आले असे ते आवर्जून सांगतात.
'''अभंग-४२'''
बाळक जाणेना मातेसी । तिचे मन तयापखशीं
तैसा देव हा दयाळ । करी भक्तांचा सांभाळ
धेनु वत्साचेनि लागें। धांवें त्यांचे मागें मागें
पक्षी वेंधतसे गगन । पिलांपाशी त्याचें मन
मत्स्यआठवितां पाळी । कूर्म द्रुष्टीनें सांभाळी
रामीरामदास म्हणे । मायाजाळाचीं लक्षणें
'''भावार्थ'''--लहान मूल आईला ओळखत नाही पण ती मात्र सतत त्याचाच विचार करीत असते देव हा माते सारखाच दयाळू असून तो भक्तांचा सांभाळ करतो. गाय वासरासाठी मागे धावते पक्षी आकाशात उडतो पण त्याचे मन सतत घरट्यातील पिलापाशी असते मासे सतत स्मरण करून आपल्या पिलांचे पालन पोषण करतात तर कासव आपल्याi दृष्टीने पिलांचा सांभाळ करत असते संत रामदास म्हणतात की ही सगळी मायेची लक्षणे आहेत.
'''अभंग--४३'''
गजेंद्र सावजे धरिला पानेडीं। रामे तेथे उडी टाकली
प्रल्हाद गांजिला तया कोण सोडी ।रामे तेथे उडी टाकीयेली
तेहेतीस कोटी देव पडिले बांदोडी ।रामे तेथे उडी टाकियेली
दासा पायी पडली देहबुध्दीबेडी। रामे तेथे उडी टाकियेली रामदास म्हणे कां करिसी वणवण। रामें भक्त कोण उपेक्षिले
'''भावार्थ'''-श्री राम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाही ,हे पटवून देण्यासाठी संत रामदास अनेक उदाहरणे देत आहेत. गजेंद्राचा पाय मगरीने पकडल्या मुळे तो मोठया संकटात सापडला. श्री रामाने तेथे धाव घेऊन त्याची सुटका केली .भक्त प्रल्हादाला छळत असलेल्या त्याच्या पित्यापासून सुटका करण्यासाठी विष्णु नरसिंह बनून आले. तेहतीस कोटी देवांची सुटका करण्यासाठी श्री रामांनी रावणाचा वध केला .रामदास म्हणतात, दासांच्या पायात जेव्हा देहबुध्दीची बेडी पडते ती सोडवण्यासाठी श्री राम तत्परतेने धाव घेतात, ते भक्तांची कधीच उपेक्षा करीत नाहीत तेंव्हा भक्तांनी चिंताग्रस्त होऊन वणवण करू नये .
'''अभंग ४४'''
ध्यान करु जातां मन हरपलें। सगुणी जाहलें गुणातीत
जेथें पाहें तेथें राघवाचें ठाण। करीं चाप बाण शोभतसे
रामरुपीं दृष्टि जाऊनी बैसली। सुखें सुखावली न्याहाळितां
रामदास म्हणे लांचावलें मन। जेथें तेथें ध्यान दिसतसे
'''भावार्थ''' --या अभंगात संत रामदास रामाचे ध्यान करीत असताना आलेल्या अनुभवाचे वर्णन करीत आहेत ते म्हणतात, ध्यान करीत असताना मनच हरपून गेले मनाचे मनपणच नाहिसे झाले ,सत्व, रज, तम या गुणांच्या अतीत झाले .सर्वत्र चापबाणधारी रामरुपच भरुन राहिले आहे अशी जाणिव झाली.हे रामरुप बघताना मन सुखावले. या सुखासाठी मन लालचावले.जेथे तेथे हेच रामरुप, त्या शिवाय दुसरे काही दिसेनासे झाले.
'''अभंग--४६'''
सोयरे जिवलग मुरडती जेथूनी। राम तये स्थानीं जिवलग
जीवातील जीव स्वजन राघव। माझा अंतर्भाव सर्व जाणे
अनन्यशरण जावें तया एका। रामदास रंकाचिया स्वामी
'''भावार्थ''' --आपले सगेसोयरे ज्या प्रसंगी आपली उपेक्षा करुन आपल्याला सोडून निघून जातात त्यावेळी केवळ राम हाच आपला जिवलग सखा असतो. आपल्या मनातील सर्व भावभावना जाणणारा,आपल्या जीवनाचा आधार, आपला स्वामी केवळ राम च आहे. संत रामदास म्हणतात की, राम रंकाचा स्वामी असून त्यांना अनन्य शरण जावे.
'''अभंग-४६'''
शिरीं आहे रामराज।औषधाचे कोण काज
जो जो प्रयत्न रामाविण। तो तो दु:खासी कारण
शंकराचे हळाहळ ।जेणें केलें सुशीतळ
आम्हा तोचि तो रक्षिता। रामदासीं नाहीं चिंता
'''भावार्थ'''- या अभंगात संत रामदास रामावरील अढळ विश्वास व्यत्त करतात. ते म्हणतात,रामराजा सारखा स्वामी असतांना अन्य उपायांची ,औषधाची गरज नाही,कारण रामाच्या
क्रुपे शिवाय केलेले सर्व प्रयत्न दु:खाचे कारण आहे. भगवान शंकराचे हळाहळ राम क्रुपेने शीतल बनले.आमचा रक्षणकर्ता रामा सारखा स्वामी असतांना रामदासांना कसलीच चिंता नाही.
'''अभंग-४७'''
ठकाराचें ठाण करीं चापबाण। माझें ब्रह्मज्ञान ऐसें आहे.
रामरुपीं देहो जाला नि:संदेहो ।माझें मनीं राहो सर्वकाळ
मुखीं रामनाम चित्ती घनश्याम। होतसे विश्राम आठवितां
रामदास म्हणे रामरुपावरीं ।भावें मुक्ति चारी ओवाळीन
'''भावार्थ'''- हातामध्ये धनुष्य बाण घेतलेले श्री रामाचे रुप पाहातांच मन नि:संदेह बनते . हे रामरुप मनांत, रामाचे नाम मुखात, तोच घनश्याम अंतःकरणात आठवावा कीं ज्या मुळे मनाला पूर्ण विश्वाम, पूर्ण शांती मिळते.संत रामदास म्हणतात, रामरुपा वरुन आपण चारी मुक्ती ओवाळून टाकतो.
'''अभंग--४८'''
कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत। तेथें मी निवांत बैसेईन
बैसेईन सुखरुप क्षणैक। पाहिन विवेक राघवाचा
स्वरुप राघवाचे अत्यंत कोमळ। जेथें नाही मळ, माईकांचा
माईकांचा मळ जाय तत्क्षणीं ।रामदरुशणीं रामदास
'''भावार्थ''' --
संत रामदास म्हणतात, अगदी एकांतात, निवांतपणे कल्पनेच्या मनोराज्यात क्षणभर का होईना सुखेनैव बसून राघवाच्या विवेक विचारावर मन एकाग्र करावेसे वाटते. रामाचे स्वरुप अत्यंत कोमल, निर्मल आहे. तेथे खोट्या मायेचा मळ नाही. रामाचे दर्शन होताच मायेचा मळ निघून जातो आणि चित्त शुध्द होते.
'''अभंग--४९'''
भगवंताचे भक्तीसाठी। थोर करावी आटाटी
स्वेदबिंदु आले जाण ।तेंचि भागीरथीचे स्नान
सकळ लोकांचे भाषण। देवासाठीं संभाषण
जें जें हरपलें सांडले ।देवाविण कोठें गेलें
जठराग्नीस अवदान। लोक म्हणती भोजन
एकवीस सहस्त्र जप। होतो न करितां साक्षेप
दास म्हणे मोठें चोज। देव सहजीं सहज
'''भावार्थ''' -देवाच्या भक्तीसाठी खूपच प्रयत्न करावे लागतात .भक्ती भावामध्ये शरीरावर आलेले स्वेदबिंदू हे जणू गंगेचे स्नान होय .आपल्या जवळच्या लोकांशी झालेले बोलणे हेच देवाशी केलेले संभाषण .आपल्याकडून जे हरवते ,जे सांडते ते देवाकडेच जाते कारण देव सगळीकडे आहे सर्व माणसांमध्ये भरून राहिला आहे. पोटात भडकलेल्या भुकेच्या अग्निला घातलेले अन्नाचे इंधन म्हणजेच भोजन . आपण दिवसात जे २१००० श्वास घेतो तोच देवासाठी केलेला अजपा जप होय . संत रामदास म्हणतात हेच एक मोठे कौतुक आहे की, देव इतका सहजा-सहजी प्राप्त होतो.
'''अभंग--५०'''
वेधें भेदावें अंतर ।भक्ति घडे तदनंतर
मनासारखें चालावें ।हेत जाणोनि बोलावें
जनी आवडीचे जन ।त्यांचे होताती सज्जन
दास म्हणे निवडावें ।लोक जाणोनियां घ्यावे
'''भावार्थ'''-संत रामदास म्हणतात ,देव भक्ता मधील अंतर कमी होते तेंव्हाच भक्ति निर्माण होते.आपल्या मना प्रमाणे वागावें आणि आपल्या व इतरांच्या मनातिल हेतू जाणून बोलावे .
सामान्य लोकांमध्ये जे लोकप्रिय होतात ते सज्जन मानले जातात. म्हणून लोकांची मने जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे.
'''अभंग -५१'''
रामभक्तीविण अणु नाही सार। साराचेंहि सार रामनाम
कल्पनाविस्तार होतसे संहारु ।आम्हा कल्पतरु चाड नाहीं
कामनेलागुनी विटलासे मनु ।तेथें कामधेनु कोण काज
चिंता नाहीं मनीं राम गातां गुणीं।तेथें चिंतामणी कोण पुसे
रामदास म्हणे रामभक्तीविणें।जाणावें हें उणें सर्वकांही
'''भावार्थ'''
रामनाम हे सर्व अविनाशी वस्तुंचे सार आहे.रामनामाशिवाय
सर्व असार आहे.असे सांगून संत रामदास म्हणतात कल्पतरु(इच्छिले फळ देणारे झाड )हा कल्पना विस्तार आहे,तेंव्हा त्याची ईच्छा नाही.रामनाशिवाय मनांत कोणतिही कामना नाही त्या मुळे कामधेनुची अभिलाषा नाही.श्री रामाचे गुण गातांना मनाला कसलिही चिंता नाही तर चिंतामणिची पण अपेक्षा नाही.संत रामदास खात्रीपूर्वक
सांगतात की,कल्पतरु,कामधेनु,चिंतामणी हे सर्व रामभक्तीच्या तुलनेने अगदी गौण आहेत.
'''अभंग--५३'''
ऐसे आत्मज्ञान उध्दरी जगासी। पाहेना तयासी काय करुं
सर्व काळ गेला दारिद्रय भोगितां।वैराग्य पाहतां तेथें नाहीं
दारिद्रयाचें दु:ख केलें देशधडी। रामराज्य गुढी उभविली
उभविली गुढी भक्तिपंथें जावें। शीघ्रचि पावावें समाधान
समाधान रामीं रामदासां जालें।सार्थकानें केलें सार्थकचि
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास जीवनाची सार्थकता कशात आहे हे स्पष्ट करून सांगत आहेत .आजवरचे सर्व आयुष्य दारिद्र्य भोगताना गेले पण तरीही जीवनात वैराग्य आले नाही हे दुःख बाजूस सारून रामराज्याची गुढी उभारून भक्तिमार्गाने जाण्याचे ठरवले. राम भक्तीमुळे संत रामदासांना पूर्ण समाधान प्राप्त झाले .जीवनाचे सार्थक करणाऱ्या श्री रामांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले असे संत रामदास अगदी निसंशयपणे सांगतात हे आत्मज्ञान जगाला उद्धरून उजळून टाकत.पण त्या कडे कोणी लक्ष्य देत नाही अशी खंत संत रामदास व्यत्त करतात.
'''अभंग--५३'''
कौल जाला रघुनाथाचा ।मेळा मिळाला संतांचा
अहंभाव वरपेकरी ।बळे घातला बाहेरी
क्षेत्रीं मंत्री विवेक जाला। क्रोध देशोधडी केला
काम देहींच कोंडिला।लोभ दंभ नागविला
फितवेकर होता भेद ।त्याचा केला शिरच्छेद
तिरस्कार दावेदार ।त्यास बोधे केला मार
मन चोरटे धरिलें ।नित्यनेमे जंजरिले
आळस साक्षेपें घेतला।पायीं धरुनि आपटिला
द्वेष बांधोनि पाडिला।खेद खाणोनि ताडिला
गर्व ताठा विटंबिला।वाद विवेके झोडिला
करुनि अभावाचा नाश ।राहे रामीं रामदास
'''भावार्थ--'''
रघुनाथाचा कौल मिळतांच संतांचा मेळा जमला संतांनी अहंभावाला, मीपणाला जबरदस्तीने बाहेर घालविला. देहरूपी क्षेत्राचा विवेक हा मंत्री झाला. क्रोधाला हद्दपार केला. कामवासनेला देहाच्या तुरुंगात कोंडला लोभ आणि दांभिकता यांचे पूर्ण उच्चाटन केले.फितुरी करणाऱ्या भेदाचा शिरच्छेद केला .तिरस्कार हा दावेदार सारखा होता त्याच्यावर उपदेशाचा मारा केला. त्या चोरट्या चंचल मनाला धरुन ठेवले.नित्यनेमाने आळसाला पायाला धरून आपटला व त्याचा समाचार घेतला.मत्सराला बांधून कैद केले. .खेदाचे मूळ खणून काढले .गर्वाची विटंबना केली. विवेकाचने वाद झोडून काढला .अशाप्रकारे सर्व अभावांचा नाश करून रामदास रामचरण स्थिर झाले.
अभंग--५४
असोनि ईंद्रियें सकळ।काय करावीं निष्फळ
नाहीं कथा निरुपण।तेंचि बधिर श्रवण
नाहीं देवाचें वर्णन ।तें गे तेंचि मुकेपण
नाहीं पाहिलें देवासी ।अंध म्हणावें तयासी
नाहीं उपकारा लाविले।तें गे तेचि हात लुले
केले नाही तीर्थाटण।व्यर्थ गेले करचरण
काया नाहीं झिजविली।प्रेतरुपचि उरली
दास म्हणे भक्तिविण ।अवघे देह कुलक्षण
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास नवविधा भक्तीचा महिमा वर्णन करून सांगत आहेत .कथा निरूपण न करणारे ,कान असूनही बहिरे .,देवाचे गुणवर्णन न करणारे,जीभ असूनही मुके ,देवाचे रूप न पहाणारे ,डोळे असूनही आंधळे ..,परोपकार न करणारे हात असूनही लुळे. पाय असूनही तीर्थयात्रा न करणारे पांगळे आहेत असे सांगून संत रामदास शेवटी म्हणतात ,अशा रीतीने देवाच्या भक्तीत काया झिजवली नाही तर ती केवळ प्रेतच होय .सर्व इंद्रिये असूनही ती जर देवाची भक्ती करण्यात वापरली नाही तर तो देह कुलक्षणी ,निष्फळ समजावा.
'''अभंग--५५'''
वाणी शुध्द करीं नामें। चित्त शुध्द करीं प्रेमें
नित्य शुध्द होय नामीं ।वसतांही कामीं धामीं
कान शुध्द करी कीर्तन। प्राण शुध्द करी सुमन
कर शुध्द राम पूजितां। पाद शुध्द देउळीं जातां
त्वचा शुध्द करी रज। मस्तक नमितां पादांबुज
रामापायीं राहतां बुध्दि रामदासा सकळ शुध्दि
'''भावार्थ--'''
नवविधा भक्तिचा महिमा सांगणाऱ्या या अभंगात संत रामदास आपल्या सर्व इंद्रियांची शुद्धी कशामुळे होते याविषयी सांगत आहेत .देवाच्या नावाचा जप केल्याने वाणी शुद्ध होते .देवा वरचे प्रेम मन शुद्ध करत .देवाचे किर्तन ऐकल्याने कान शुद्ध होतात .तर भावपूर्ण मन प्राण शुद्ध करते .रामाचे पूजन हात शुद्ध करतात .देवळात देवदर्शनास गेल्याने पाय शुद्ध होतात .त्वचा धुळीचे कण शुद्ध करतात. आणि देवाला नमन करताना मस्तक शुद्ध होते .श्रीरामाच्या चरणकमलांना चरण स्पर्श केला असता बुद्धी शुद्ध होते. अशा रीतीने संपूर्ण देहाची शुद्धी होते .असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--५६'''
काम क्रोध मद मत्सर। जरी हे जाले अनावर
यास करावें साधन । सदा श्रवण मनन
बोलाऐसें चालवेना।जीव भ्रांति हालवेना
दृढ लौकिक सांडेना।ज्ञानविवेक मांडेना
पोटीं विकल्प सुटेना ।नष्ट संदेह तुटेना
दास म्हणे निर्बुजले ।मन संसारीं बुडालें
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास राम कथेचे श्रवण व मननाचे काय फायदे होतात हे सांगत आहेत .जेव्हा वासना राग द्वेष हे मनाचे शत्रू अनावर होतात, जेव्हा आपल्याला बोलण्या प्रमाणे वागता येत नाही , लौकिकाचा हव्यास सुटत नाही, विवेक सुचत नाही, मनामध्ये निर्माण झालेल्या विपरीत कल्पनां पासून सुटका होत नाही, बुद्धी नष्ट करणारा संशय नाहीसा होत नाही, गोंधळलेले मन संसार सागरात बुडून जाते .संत रामदास म्हणतात या परिस्थितीतून सुटण्याचे एकच साधन आहे .राम कथा श्रवण करणे आणि श्री रामाच्या विवेक व कृती यावर मनन करणे हे होय.
'''अभंग--५७'''
रामनामकथा श्रवणीं पडतां ।होय सार्थकता श्रवणाची
मुखें नाम घेतां रुप आठवलें।प्रेम दुणावलें पहावया
राम माझे मनीं शोभे सिंहासनीं। एकाएकीं ध्यानीं सांपडला
रामदास म्हणे विश्रांति मागेन। जीवींचें सांगेन राघवासी
'''भावार्थ--'''
राम कथा कानावर पडताच श्रवण केल्याचे सार्थक होते. रामनामाचा जप सुरू होताच रामाचे रूप आठवते आणि ते पहाण्यासाठी मन आतुर होते .सिंहासनावर विराजमान झालेला राम मनात आहे तोच एकाएकी ध्यानात सापडतो. संत रामदास म्हणतात या राघवाला मनातील गोष्टी सांगाव्यात त्याच्याकडे मनासाठी पूर्ण विश्रांती मागावी असे वाटते.
'''अभंग--५८'''
निरुपणाऐसें नाहीं समाधान ।आणिक साधन आढळेना
भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे। भावार्थ सांपडे निरुपणें
शांति क्षमा दया नैराश्यता मनीं। अवस्था उन्मनी निरुपणें
भ्रांतीचा संदेह तुटे एकसरा। दास म्हणे करा निरुपण
'''भावार्थ--'''
संत रामदास या अभंगात म्हणतात की, राम कथा निरूपणा सारखे समाधान कशातच नाही .यासारखे दुसरे साधन नाही .राम कथा निरुपणातून भक्ती व ज्ञान या दोन्ही गोष्टींचा लाभ होतो आणि वैराग्य आवडू लागते .कथा निरुपणातून भावार्थ समजतो .दया क्षमा शांती या सद्गुणांचा लाभ होतो .मनाचे नैराश्य नाहीसे होऊन निरूपणा मुळे मनाचे उन्मन होते .संदेह मुळापासून नाहीसा होतो. संत रामदास परत परत निरूपण करण्यास सांगत आहेत.
'''अभंग--५९'''
एकदां जेवितां नव्हे समाधान ।प्रतिदिनीं अन्न खाणें लागें
तैसें निरुपण केलेंचि करावें ।परी न धरावें उदासीन
प्रत्यहीं हा देहो पाहावा लागतो। शुध्द करावा तो रात्रंदिस
प्रत्यहीं देहानें भोगलें भोगावें। त्यागिलें त्यागावें दास म्हणे
'''भावार्थ--'''
एकदाच जेवण घेतल्याने कायमचे समाधान मिळत नाही. रोजच अन्न खावे लागते .त्याप्रमाणे एकदा केलेले निरूपण परत परत करावे त्या बाबतीत उदासीन राहू नये. आपल्याला आपला देह परत परत स्वच्छ करावा लागतो. भोगलेले परत परत भोगावे लागते .ज्यांचा त्याग केला त्याचा परत परत त्याग करावा लागतो .रात्रंदिवस असे केल्याने देह व मन शुद्ध होते असे संत रामदास सांगतात.
'''अभंग--६०'''
कथानिरुपणें समाधि लागली। वासना त्यागिली अंतरीची
नाहींआपपर कीर्तनीं तत्पर । मनीं सारासार विचारणा
अर्थारुढ मन श्रवण मनन ।होय समाधान निजध्यास
रामीरामदासीं कथेची आवडी ।लागलीसे गोडी नीच नवी
'''भावार्थ--'''
ज्याच्या मनामध्ये आपला व परका असा दुजाभाव नाही, मनात नेहमीच सार व असार काय याचा विचार करत असतो, नेहमी श्रवण व मनन करतांना अर्थाचा मागोवा घेत असतो, देवाच्या कीर्तनात अतिशय तत्पर असतो, कीर्तन रंगी रंगून जाणे हा ज्याचा निजध्यास आहे व त्यात त्याला समाधान मिळते. संत रामदास म्हणतात अशा भक्तांना रामकथेची अविट गोडी निर्माण होते व ही गोडी नेहमी वाढतच जाते.
'''अभंग--६१'''
राघवाची कथा पतितपावन। गाती भक्तजन आवडीनें
राघवाच्या गुणा न दिसे तुळणा। कैलासींचा राणा लांचावला देवांचें मंडण भक्तांचे भूषण। धर्मसंरक्षण राम एक
रामदास म्हणे धन्य त्यांचे जिणें कथानिरुपणे जन्म गेला
'''भावार्थ--'''
राघवाची कथा पतितांना पावन करणारी असल्याने भक्त ती आवडीने गातात .श्रीराम सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असून भक्तांचे भुषण आहेत .धर्म रक्षणाचे काम करणारे श्रीराम केवळ एकमेव अद्वितीय आहेत .रामाचे गुण अतुलनीय आहेत .रामदास म्हणतात अशा गुणसंपन्न रामाच्या कथांचे निरूपण करणारे भक्त धन्य होत. त्यांचे जीवन सफल झाले आह.
'''अभंग--६२'''
त्याचे पाय हो नमावें।त्याचें किर्तन ऐकावें
दुजियासी सांगे कथा। आपण वर्ते त्याचि पंथा
कीर्तनाचें न करी मोल। जैसे अमृताचे बोल
सन्मानिता नाहीं सुख। अपमानितां नाहीं दु:ख
ऐसा तोचि हरिदास ।लटकें न वदे रामदास
'''भावार्थ--'''
हरिदास आपल्या कीर्तनातून हरिकथा भक्तांना ऐकवतात एवढच नव्हे तर कथेतील आदर्शांचे स्वतः पालन करतात. अशा हरिदासांना सन्मानाचे सुख नसते व अपमानाचे दुःख नसते .त्यांचे कीर्तन म्हणजे केवळ अमृताचे बोल असतात. अनमोल असतात .संत रामदास म्हणतात, अशा हरिदासांचे किर्तन ऐकावे व आदराने त्यांना नमन करावे. .हे भक्तच केवळ हरिदास म्हणवून घेण्यास योग्य असतात. हे लटके नसून निसंशय खरे आहे
'''अभंग--६३'''
मुक्तपणे करी नामाचा अव्हेरू ।तरी तो गव्हारु मुक्त नव्हे
उच्चारितो शिव तेथें किती जीव ।बापुडे मानव देहधारी
रामनाम वाचें रुप अभ्यंतरीं ।धन्य तो संसारीं दास म्हणे
'''भावार्थ--'''
मुक्तपणे नामाचा अव्हेर करणारा अडाणि कधीही मुक्त होऊ शकणार नाही .शंकराच्या नामाचा जप करणारे कितीतरी मानव देहधारी बापुडवाणे जीवन जगतात .संत रामदास म्हणतात ,अंतकरणात रामाचे रूप व मुखात सतत रामाचे नाव असणारे भक्त संसारी असूनही धन्य होत.
'''अभंग--६४'''
आत्मज्ञानी आहे भला। आणि संशय उठिला
त्यास नामचि कारण। नामें शोकनिवारण
नाना दोष केले जनीं। अनुताप आला मनी
रामी रामदास म्हणे। जया स्वहित करणें
'''भावार्थ--'''
आत्मज्ञानी असूनही जर त्याच्या मनात संशय निर्माण झाला तर संशयाचे निराकरण करण्यासाठी नामाचे साधन केले पाहिजे .कारण नामामुळेच सर्व संशयाचे ,दुःखाचे निवारण होते.संसारात असतांना आपल्यात अनेक दोष निर्माण होतात पण त्याबद्दल पश्चाताप झाल्यास त्या दोषांचे निराकरण होऊन अंती कल्याण होते असे संत रामदास स्पष्टपणे सांगतात.
'''अभंग--६५'''
रात्रंदिन मन राघवीं असावें ।चिंतन नसावें कांचनाचें
कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन ।जन्मासी कारण हेंचि दोन्ही
दोन्ही नको धरुं नको निंदा करुं।तेणें हा संसारू तरशील
तरशील भवसागरीं न बुडतां। सत्य त्या अनंताचेनि नामें
नामरुपातीत जाणावा अनंत। दास म्हणे संतसंग धरा
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास सांगतात की, रात्रंदिवस आपले मन राघवाच्या चिंतनात असावे, पैशाचे चिंतन नसावे. धन व परस्त्री चिंतन यामुळेच परत परत जन्मास यावे लागते. त्याच प्रमाणे कुणाची निंदा करू नये. त्यामुळे भवसागरात न बुडता हा संसार तरून जाता येईल. ईश्वर हा अनंत नामा रूपाने नटला आहे .त्या सत्यरूपी अनंताला संत संगती धरल्यास जाणतां येत.
'''अभंग--६६'''
लोभा नवसांचा तो देव बध्दांचा।आणि मुमुक्षांचा गुरू देव
गुरु देव जाण तया मुमुक्षांचा।देव साधकांचा निरंजन
निरंजन देव साधकांचे मनीं ।सिध्द समाधानी देवरुप
देवरुप झाला संदेह तुटला।तोचि एक भला भूमंडळीं
भूमंडळीं रामदास्य धन्य आहे। अन्यनता पाहें शोधूनियां
'''भावार्थ--'''
ज्यांच्या मनात लोभ असल्याने ते संसारात बद्ध असतात ,असे लोक हव्यासापोटी देवाला नवस करतात. त्यांचा देव नवसाचा असतो . मोहापासून सुटलेले लोक मोक्षाची इच्छा करणारे असतात. ते आपल्या गुरुला देव मानतात .इच्छा धरून मोक्षाची जे साधना करतात ते साधक होत ,ते निरंजनाला मनात ठेवून त्याची उपासना करतात .तर सिद्ध साधनेमुळे पूर्ण समाधानी बनतात, त्यांच्या मनात कोणताही संदेह नसतो .असे सिद्ध पुरुष भुमंडळावर धन्य होत. असे रामदास शोधूनही इतरत्र सापडणार नाहीत, असे संत रामदास सुचवतात.
'''अभंग--६७'''
राम कैसा आहे हें आधीं पाहावें। मग सुखेनावें दास्य करुं
दास्य करुं जन देव ओळखोन । जालें ब्रह्मज्ञान दास्य कैचें
दास्य कैचें घडी देवासी नेणतां ।वाउगें शिणतां श्रम उरे
समाधान देव पाहतां घडेल । येर बिघडेल दास म्हणे
'''भावार्थ --'''
रामाचे रूप ,गुण, चरित्र कथा हे आधी जाणून मगच सुखाने रामाचे दास बनावे .देवाला ओळखून दास्यत्व पत्करले असता हळूहळू ब्रह्मज्ञान होते .मग दास्यत्वाची भावनाच उरत नाही देवाला न ओळखता दास्य घडू शकत नाही ते केवळ निरर्थक श्रम होतात .देवाला जाणल्यानेच मनाचे समाधान होईल ,नाहीतर सारे बिघडेल असे सांगून संत रामदास भक्तांना सावधपणाचा इशारा देत आहेत.
अभंग-६८
जो जो भजनासी लागला । तो तो रामदास जाला
दासपण रामीं वाव ।रामपणा कैंचा ठाव
रामीं राम तोहि दास ।भेद नाहीं त्या आम्हांस
रामदास्य करुनि पाहे। सर्व स्रुष्टी चालताहे
प्राणिमात्र रामदास । रामदासीं हा विश्वास
'''भावार्थ--'''
संत रामदास म्हणतात जो भजनात रममाण झाला तो रामाचा दास झाला. दास्यत्व स्वीकारल्या शिवाय राम चरणी ठाव मिळत नाही.रामातील राम तोच दास होय.राम व रामाचा दास यांच्यात भेद नाही सर्व प्राणीमात्र रामा मुळेच अस्तित्वात आह. राम त्यांच्यातील प्राण आहे असा संत रामदासांचा विश्वास आहे.
'''अभंग--६९'''
दिनानाथाचे सेवक ।आम्ही स्वामींहुनि अधिक
शरणागत राघवाचे ।परि शरण दारिद्रयाचे
जें जें देवासी दु:सह । तें तें आम्हां सुखावह
रामीरामदास म्हणे । रामकृपेचेनि गुणें
'''भावार्थ--'''
रामदास राघवाचे शरणागत असूनही त्यांना दारिद्र्याच्या झळा सहन कराव्या लागतात. देव सुद्धा जे सहन करू शकत नाही ते रामदास राम कृपेमुळे सहज सहन करू शकतात.सीतापती राम हें दासांची विद्या वैभव व सुवर्ण संपत्ती आहे .श्रीराम हा रामदासांचा एकमेव सोबती आहे. श्रीराम दासांची माता, पिता बंधू आहे. केवळ रामच स्वजन, सोयरा आहे. ध्यानी मनी वसलेला राम ज्ञानाचे भांडार आहे. राम हा रामदासाचे पूर्ण समाधान आहे असे संत रामदास या अभंगात म्हणतात.
'''अभंग--७०'''
राघवाचे दास सर्वस्वे उदास । तोडी आशापाश देवराणा
देवराणा भाग्यें जालिया कैपक्षी । नाना परी रक्षी सेवकांसी
सेवकासी कांहीं न लगे साधन । करीतो पावन ब्रीदासाठीं
ब्रीदासाठीं भक्त तारिले अपार । आतां वारंवार किती सांगों
किती सांगों देव पतितपावन । करावें भजन दास म्हणे
'''भावार्थ--'''
सेवकांच्या भाग्याने त्याच्यावर देवाची कृपा झाली तर देवरा णा त्याचे सर्व प्रकारे रक्षण करतो. सर्व आशा समूळ नाहीशा करून आशा पाशातून मुक्तता करतो. त्यामुळे राघवाचे दास पूर्णपणे उदासीन होतात. त्यासाठी सेवकांना काही साधना करावी लागत नाही. आपले ब्रीद पाळण्यासाठी राघव सेवकांना पावन करतात. आपल्या ब्रीदासाठी राघवाने अनेकांना पतितपावन केले आहे हे संत रामदासांनी अनेकदां सांगितले आहे. त्यासाठी फक्त देवाचे भजन करावे असे संत रामदास सांगत आहे.
'''अभंग--७१'''
कायावाचामनें यथार्थ रामीं मिळणें।तरीच श्लाघ्यवाणें
रामदास्य कामक्रोध खंडणें मदमत्सर दंडणें।तरीच
श्लाघ्यवाणें रामदास्य जैसे मुखें बोलणें तैसी क्रिया चालणें। तरीच
श्लाघ्यवाणें रामदास्य रामदास म्हणे निर्गुण लाधणें। तरीच
श्लाघ्यवाणें रामदास्य
'''भावार्थ--'''
काया वाचा मनाने पूर्णपणे एकरूप होऊन दास्य करणे हेच खरे रामदास्य ,काम क्रोधाचे खंडन करून ,मद मत्सराला दंड देऊन केलेले दास्य, परस्त्री बद्दलची वासना नष्ट होणे, परद्रव्य अग्नीसारखे दाहक वाटणे ,बोलण्या प्रमाणे कृती करणे हीच खरी राम सेवा . संत रामदास म्हणतात सत्व रज तम या गुणांच्या अतीत होऊन निर्गुण सुख लाभणे हेच खरे रामदास्य. असे रामदास्य स्तुती करण्यायोग्य असते.
'''अभंग--७२'''
आमुचे वंशीं आत्माराम । एका पिंडींचे निष्काम
रामदास्य आलें हातां। अवघा वंश धन्य आतां
बापें केली उपार्जना । आम्ही लाधलों त्या धना
बंधु अभिलाषा टेकला । वांटा घेउनि भिन्न जाला
रामीरामदासीं स्थिति । पाहिली वडिलांची रीति
'''भावार्थ--'''
संत रामदास या अभंगात म्हणतात ,आपण रामाचे वंशज आहोत त्यामुळे हा पिंडच निष्काम आहे.रामाचे सेवक असल्याने सर्व वंश धन्य झाला.वडिलांच्या पुण्याइने राम सेवारुपी धन प्राप्त झाले. अभिलाषा नावाच्या बंधू आपला वाटा घेऊन वेगळा झाला. रामदासांना मात्र वडिलांच्या पुण्याईचा लाभ मिळाला.
अभंग --७३
मनुष्याची आशा तेचि निराशा । एका जगदीशावांचुनिया
वांचुनियां राम सर्वहि विराम । नव्हे पूर्ण काम रामेविण
संकटींचा सखा निजांचा सांगाती । राम आदि अंतीं रामदासीं
'''भावार्थ--'''
जगदीशाची कृपा नसेल तर आशेचे निराशेत रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. रामाशिवाय कोणतेही काम पूर्ण होत नाही. श्रीराम हा संकटात धावून येणारा सखा, जिवाचा सांगाती आहे. संत रामदास म्हणतात,रामदासांना
आजीवन सांभाळणारा केवळ रामच आहे.रमदासांचा राम जीवनाच्या आदि व अंती आहे.
'''अभंग--७४'''
आम्हा ये प्रपंचीं कोणी नाहीं सखा।एका रघुनायकावांचोनिया
विद्या वैभव धन मज क्रुपणाचें।जीवन जीवांचे आत्मारामु
आकाश अवचितें जरि कोसळेल।मज तेथें राखील आत्मारामु
आपिंगिलें मज श्रीरामसमर्थे । ब्रह्मांड पालथें घालूं शके
वक्रदृष्टि पाहतां भरिल त्याचा घोंट।काळाचेंहि पोट फाडू शके
रामदास म्हणे मी शरणागत त्याचा।आधार सकळांचा मुक्त केला।
'''भावार्थ--'''
रामदासांना या संसारात रघुनायका शिवाय कोणी सखा नाही. एकाएकी आकाश कोसळले तरी आत्माराम रामदासांचे रक्षण करील, कोणी वाकड्या नजरेने बघितले तर श्रीराम त्यांच्या नरडीचा घोट घेण्याइतका किंवा प्रत्यक्ष काळाचे पोट फोडू शकेल इतका समर्थ आहे असा विश्वास संत रामदास या अभंगात व्यक्त करतात. ते म्हणतात श्रीरामाने अंगीकार केल्यास आपण ब्रम्हांड देखील पालथे घालू शकतो कारण श्रीराम सर्वांचा एकमेव आधार आहे.
'''अभंग--७५'''
जठरीं लागो क्षुधा। होत नाना आपदा
भक्तिप्रेम सदा ।न सोडीं सत्य
शब्द न फुटे जरी।चिंतीन अंतरीं
भक्तिप्रम परी । न सोडी सत्य
आतांचि हा देहो । राहो अथवा जावो
रामीं प्रेमभावो । न सोडी सत्य
म्हणे रामदास । वरी पडो आकाश
राघवाची कास । न सोडी सत्य
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास आपण रामा वरची प्रेमभक्ति कधीच सोडणार नाही हे सत्य सांगत आहेत. पोटात भुकेने कितीही यातना झाल्या ,शब्द उच्चारण करण्याची शक्ती नाहीशी झाली तरी अंतकरणात रामाचेच चिंतन करीन.देह राहील अथवा जाईल याचा विचार न करता रामा विषयीचा प्रेमभाव कधीच सोडणार नाही. संत रामदास म्हणतात कीआकाश कोसळून पडले तरी राघवाची साथ कधीच सोडणार नाही.
'''अभंग--७६'''
रुप रामाचेंपाहतां। मग कैंची रे भिन्नता
दृश्य अदृश्यावेगळा । राम जीवींचा जिव्हाळा
वेगळीक पाहतां कांहीं। पाहतां मुळींच रे नाहीं
रामदासीं राम होणें । तेथें कैचें रे देखणें
'''भावार्थ--'''
संत रामदास म्हणतात रामाचे rरुप सदा सर्वकाळ डोळ्यात भरलेले असूनही दर्शनास गेले तर आकलन होत नाही. सदा सर्वकाळ मन राम चिंतनात दंग असल्याने ताटातूट होण्याचा संभवच नाही. घेऊ म्हटले असता घेता येत नाही व टाकू म्हटले तर सोडता येत नाही. त्यामुळे रामदासांना रामरूप धनाची लूट करणे शक्य होते.
'''अभंग--७७'''
माझा स्वामी आहे संकल्पापरता। शब्दीं कैसी आतां स्तुति
करु स्तुति करुं जातां अंतरला दूरी । मीतूंपणा उरी उरों नेदी
उरों नेदी उरी स्वमी सेवकपण । एकाकीं आपणाऐसें केलें
केले संघटण कापुरे अग्नीसी। तैसी भिन्नत्वासी उरी नाहीं
उरी नाही कदा रामीरामदासा। स्वये होय ऐसा तोचि धन्य
'''भावार्थ--'''
संत रामदास या अभंगात देव भक्तांमधील अद्वैत भावनेची उकल करून सांगत आहेत की त्यांचा स्वामी श्रीराम मनाच्या संकल्प विकल्पाच्या पलीकडे आहे.राम कथा ऐकून श्रीरामाच्या गुणांची स्तुती करावीशी वाटते पण शब्दांशिवाय स्तुती करता येत नाही त्यात द्वैत निर्माण होते.दर्शन होताच मन राम रूपात विरून जाते तेथे मी तूं पणा, स्वामी सेवक पणा उरतच नाही.द्वैत संपून जाते जसे कापूर व अग्नि क्षणात समरस होतात. कापराचे भिन्नत्व पूर्णपणे विलयास जाते तसेच रामदास स्वतः रामरूप बनून जातात ते धन्य होत असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--७८'''
कांहीं दिसे अकस्मात। तेथें आलें वाटे भूत
वायां पडावें संदेहीं। मुळीं तेथें कांहीं नाहीं
पुढे देखतां अंधार। तेथें आला वाटें भार
झाडझुडूप देखिलें ।तेथें वाटे कोणी आलें
रामदास सांगे खूण। भितों आपणा आपण
'''भावार्थ--'''
या अभंगात माणसाला भ्रम कशामुळे होतो व त्याचे निरसन कसे करावे याविषयी संत रामदास सांगत आहेत. काही वेळा अकस्मात एखादी अस्पष्ट आकृती दिसते ते भूतच आहे असा भ्रम होतो .वाटेवर अंधारातून जात असताना समोरून कोणीतरी येत आहे असे वाटते. जंगलातील झाडे सजीव प्राण्यासारखी भीतीदायक वाटतात संत रामदास म्हणतात जेथे काहीही नसताना काहीतरी असल्यासारखे वाटणे हे सारे कल्पनेचे खेळ आहेत. आपण आपल्याच सावलीला घाबरावे त्यातलाच हा प्रकार आहे.
'''अभंग--७९'''
वाजे पाऊल आपुलें। म्हणे मागें कोण आलें
कोण धांवतसें आड। पाहों जातां जालें झाड
भावितसे अभ्यंतरीं। कोण चाले बरोबरी
शब्दपडसाद ऊठिला। म्हणे कोण रे बोलिला
रामीरामदास म्हणे। ऐसीं शंकेचीं लक्षणे
'''भावार्थ --'''
या अभंगात संत रामदास मनात येणाऱ्या शंका-कुशंकांची लक्षणे सांगत आहेत चालताना आपल्याच पावलांचा आवाज ऐकून आपल्या मागे कुणीतरी येत आहे अशी शंका येते. चालताना कुणीतरी आपल्या बरोबर चालत असल्याचा भास होतो. विचारांती ते झाड आहे हे समजतें शब्दांचा प्रतिध्वनी ऐकू येतो व कुणीतरी बोलतो असे वाटते की सर्व शंकेची लक्षणे आहेत.
'''अभंग--८०'''
शक्ति आहे तों करावें विश्व कीर्तनें भरावें
पुण्यवंत तो साक्षेपी।आळशी लोकीं महापापी
आपुलाचि घात करी । सदा कठोर वैखरी
माणुस राजी राखों नेणें ।त्यास न मानीती शहाणे
गुणें माणूस भोंवतें। अवगुणानें थितें जातें
दास म्हणे भला भला। जेथें तेथें पवाडला
'''भावार्थ--'''
प्रत्येकाने आपल्या शक्तीप्रमाणे काम करावे उद्योगी पुरुष पुण्यवान तर अशी आळशी महापापी होय.ज्याचे बोलणे कठोर असते तो आपणच आपला घात करत असतो .ज्याला माणसाचे मन जिंकता येत नाही तो शहाणा समंजस असत नाही. गुणांनी माणूस आवडते अवगुणांनी त्याला कमीपणा येतो. संत रामदास म्हणतात त्याचे सर्वत्र पोवाडे गायले जातात स्तुती केली जाते तो माणूस भला समजावा.
'''अभंग--८१'''
मनोगत जाणे सूत्र ।।जेथ तेथें जगमित्र
न सांगतां काम करी। ज्ञानें उदंड विवरी
स्तुती कोणाची न करी। प्राणिमात्र लोभ करी
कदा विश्वास मोडीना । कोणी माणूस तोडीना
जनीं बहुतचि साहतो। कीर्तिरुपेचि राहतो
दास म्हणे नव्हे दु:खी।आपण सुखी लोक सुखी
'''भावार्थ--'''
इतरांचे मनोगत जाणण्याचे कौशल्य ज्याच्याकडे आहे तो जगत मित्र बनतो. तो नेहमी उद्योगात व ज्ञान उपासनेत दंग असतो.तो कुणाचीच स्तुती करीत नाही पण सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करतो.तो स्वतःवरील विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही.माणसांना कधीही तोडून टाकीत नाही. लोकांचे अनेक अपराध सहन करतो पण मनात दुःखाचा लवलेशही नसतो. तो स्वतः सुखी असतो व लोकांना सुखी करतो असे संत किर्तीरुपाने उरतात असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--८२'''
संतांची आकृति आणवेल युक्ती। कामक्रोधा शांति नये नये
भागवतींचा भाव आणवेल आव। करणीचा स्वभाव नये नये
रामदास म्हणे रामकृपेवांचोनी। बोलाऐसी करणी नये नये
'''भावार्थ--'''
सामान्य माणूस युक्ती प्रयुक्तिने संतांची नक्कल करू शकेल पण त्यामुळे काम व क्रोध जिंकण्याचे कौशल्य मिळवता येणार नाही .एखादी स्त्री देवीचे सोंग घेऊ शकेल पण भगवती सारखी करणी करणे शक्य नाही.संत रामदास म्हणतात,रामकृपेशिवाय माणुस देवत्वाला पोचू शकत नाही.
अभंग--८३
कर्ता एक देव तेणें केलें सर्व। तयापाशीं गर्व कामा नये
देह हें देवाचें वित्त कुबेराचें । तेथें या जीवाचें काय आहे
निमित्ताचा धणी केला असे प्राणी । पहातां निर्वाणीं जीव कैचा
दास म्हणे मना सावध असावें ।दुश्चित्त नसावें सर्वकाळ
'''भावार्थ--'''
सर्व सजीव सृष्टी ही देवाची निर्मिती असून सर्व धन कुबेराचे आहे.येथे जिव केवळ निमित्तमात्र आहे असा संत रामदासांच्या विश्वास आहे.देवापाशी अहंकारानें वागू नये.चित्त निर्मल ठेवण्यासाठी मनाने सतत सावध असावे असा उपदेश संत रामदास करीत आहेत.
'''अभंग--८४'''
दृढ धरी मना जानकीजीवना। तेणें समाधाना पावशील
पावशील निज स्वरुप आपुलें। जरी तें घडलें रामदास्य
रामदास्य घडे बहुतां सुक्रुतें । कांहीं पुण्य होतें पूर्वजांचें
'''भावार्थ--'''
जानकी जीवन श्रीरामाची मनामध्ये अढळ भक्ती निर्माण होईल तेव्हाच आपले जे निजरूप आत्माराम ते आपल्याला प्राप्त होईल.त्यातूनच अतीव समाधान मिळेल रामाचे दास्यत्व पूर्वसुकृतामुळे व पूर्वजांच्या पुण्याईने मिळते असे संत रामदास निष्ठापूर्वक सांगतात.
'''अभंग --८६'''
शरण जावें रामराया ।पुढती न पाविजे हे काया
जीव जीवांचा आहार । विश्व होतसे काहार
एक शोकें आक्रंदती ।तेणें दुजे सुखी होती
दास म्हणे सर्व दु:ख । रामाविण कैसे सुख
'''भावार्थ--'''
हे विश्व म्हणजे एक मोठा शिकारखाना आहे.येथे दुर्बळ जीव सबळ प्राण्यांचा आहार आहे.काही दुःखाने आक्रंदत असतात तेव्हां काही सुखाने जगतात. जन्म मरणाचा खेळ अव्याहत सुरू आहे.संत रामदास म्हणतात जन्म-मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी रामरायाला शरण जावे. रामाशिवाय यातून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही.
'''अभंग--८६'''
वासनेची बेडी देहबुध्दि वांकडी। वाजे हुडहुडी ममतेची
वैराग्याचा वन्ही विझोनिया गेला। संचित खायाला पुण्य नाही
भक्ति पांघरूण तें माझें सांडलें ।मज ओसंडिलें संतजनीं
रामदास म्हणे ऐसियाचें जिणें। सदा दैन्यवाणें रामेविण
'''भावार्थ--'''
आत्म बुद्धीचा सरळ मार्ग सोडून देहबुद्धीच्या वाकड्या मार्गाने जात असताना वैराग्याचा अग्नी विझून गेला आहे माया ममतेच्या थंडगार स्पर्शाने हुडहुडी भरलीआहे.पायात वासनेची बेडी पडली आहे. भक्तीचे उबदार वस्त्र हरवून गेले आहे.पूर्वसंचिताचा पुण्यरुपी ठेवा गाठीशी राहिला नाही. संतजनांच्या संगतीला पारखा झालो आहे.।संत रामदास म्हणतात अशा लोकांचे जीवन रामाशिवाय दैन्यवाणे आहे.
'''अभंग --८७'''
परिचयें जेथें अत्यंत संबंध ।तेथें उठे खेद विक्ल्पाचा
म्हणोनियां मना निस्प्रुह असावें सर्वथा नसावें एके ठायीं
सर्वकाळ गेला उद्वेगी पडतां ।कोणे वेळे आतां समाधान
अभ्यंतर पोळे राम विसंभतां। दास म्हणे आतां समाधान
'''भावार्थ--'''
अतिपरिचयाने घनिष्ठ संबंधजुळतो तेथे मनामध्ये विकल्प निर्माण होतात ,उद्वेग वाटतो ,समाधान नाहीसे होते यासाठी माणसाने एका ठिकाणी फार काळ राहू नये व निरपेक्षपणे राहावे असे संत रामदास सुचवतात. श्रीरामाच्या विसर पडल्यामुळे पश्चात्तापाने अंतरंग पोळून निघतेंआणि मग चित्त शुध्द होऊन समाधान मिळतें.
अभंग--८९
देव पाषाण भाविला। तोचि अंतरीं दाविला
जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथे
दृश्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा
दास म्हणे भावातीत। होतां प्रगटे अनंत
'''भावार्थ--'''
दगडाचा देव करून त्याची भक्तिभावाने पूजा केली तोच देव अंतकरणात प्रकटला कारण जसा भाव तसा देव असे म्हणतात. संसाराचा दृश्य पसाऱ्यात माणसाला गुंतवून देव अदृश्य झाला.संत रामदास म्हणतात भाव- भावनांच्या पलीकडे गेल्यास अनंत प्रकट होते.
'''अभंग--८९'''
एक लाभ सीतापती। दुजी संताची संगती
लाभ नाहीं यावेगळा। थोर भक्तीचा सोहळा
हरिकथा निरुपण । सदा श्रवण मनन
दानधर्म आहे सार। दास म्हणे परोपकार
'''भावार्थ--'''
सीतापती श्रीरामांचा लाभ व संतांची संगती याशिवाय दुसरा अपूर्व लाभ नाही.हा भक्तीचा सोहळा आहे.संत रामदास म्हणतात ,हरिकथेचे सतत श्रवण मनन व निरुपण तसेच दानधर्म व परोपकार हे भक्तीचे सार आहे.
'''अभंग--९०'''
जो कां भगवंताचा दास ।त्याने असावें उदास
सदा श्रवण मनन। आणि इंद्रियदमन
नानापरी बोधुनि जीवा। आपुला परमार्थ करावा
आशा कोणाची न करावी। बुध्दि भगवंतीं लावावी
रामदासीं पूर्णकाम। बुध्दि दिली हे श्रीरामे
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास भगवंताचा दास कसा असावा याचे विवेचन करीत आहेत.आशा-अपेक्षा ,हवेसे नकोसे ,याबाबतीत उदासीन असावा. सतत हरि कथा श्रवण मनन करून इंद्रियांचे दमन करावे. कोणाकडूनही कसलीही आशा ,अभिलाषा नसावी.आपल्या साऱ्या वृत्ती भगवंताकडे लावाव्यात.दिलेल्या बुध्दीचा उपयोग करून पूर्णकाम ,समाधानी बनावे.
'''अभंग--९१'''
पतित हे जन करावे पावन। तेथे अनुमान करूं नये
करुं नये गुणदोष उठाठेवी। विवेकें लावावी बुध्दि जना
बुध्दि लावी जना त्या नाव सज्ञान । पतितपावन दास म्हणे
'''भावार्थ--'''
जे लोक पतित आहेत त्यांना पावन करून घ्यावे ,त्यात अनुमान करू नये त्यांच्या गुणदोषांची चर्चा करू नये. विवेकाने पतीतांची बुद्धी बदलण्याचा प्रयत्न करावा. याचा अर्थ अज्ञानी लोकांना सज्ञानी बनवावे,असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--९२'''
पोट भरावया मांडिले उपास। जाला कासाविस लाभेंविण
ब्रम्ह साधावया कर्ममार्गे गेला। तंव कर्मे केला कासाविस
सुटका व्हावया बंधनचि केलें। तेणें तें सुटलें केंवि घडे
एक व्यथा एक औषध घेतलें। दास म्हणे जालें तयापरी
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास आपल्या व्यथा व त्यावरील उपाय याबद्दल बोलत आहेत. आपल्याला भूक लागली तर जेवण करण्याचे सोडून उपास केला तर काहीच लाभ होणार नाही. जीव मात्र कासावीस होईल कारण तप स्वाध्याय आणि ईश्वरभक्ती ही आत्मशुद्धीची साधने सांगितली आहेत. उपवासाची गणना तपात होते व ते शरीर शुद्धी चे साधन आहे.भूक लागली असता हा उपाय करणे व्यर्थ आहे. ब्रम्हज्ञान मिळवण्यासाठी कर्मयोगाने काहीच लाभ होणार नाही.व्याधी पासून सुटका मिळावी म्हणून जर संसाराचा त्याग केला तर त्यापासून सुटका होईल हें घडणार नाही.व्याधी समजून घेऊनच औषध केले पाहिजे. संसारिक दुःखावर रामभक्ती हाच एक उपाय आहे.
'''अभंग--९३'''
अर्थेविण पाठ कासया करावें। व्यर्थ का मरावें घोकुनीयां
घोकुनिया काय वेगीं अर्थ पाहे। अर्थरुप राहे होउनियां
होउनिया अर्थ सार्थक करावें। रामदास भावें सांगतसे
'''भावार्थ--'''
अर्थ समजल्याशिवाय केवळ शब्दांचे पाठांतर करून उपयोग नाही घोकून पाठ करण्याचे व्यर्थ श्रम करू नयेत. त्यातील अर्थाशी एकरूप होऊन त्याप्रमाणे आचरण केल्यास जीवनाचे सार्थक होईल असे संत रामदास या अभंगात सांगतात.
'''अभंग--९५'''
ज्ञानाचें लक्षण क्रियासंरक्षण। वरी विशेषेण रामनाम
अंतरीचा त्याग विवेके करावा। बाहेर धरावा अनुताप
ब्रह्मादिका लाभ ज्ञानाचा दुर्लभ। तो होय सुलभ साधुसंगें
साधुसंगें साधु होइजे आपण। सांगतसे खुण रामदास
'''भावार्थ--'''
आपणास अवगत झालेले ज्ञान प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे ज्ञानाचे लक्षण आहे. अंतःकरणातील लोभ,, मोह ,क्रोध या भावनांचा विवेकाने त्याग करावा. ब्रम्हदेवा सारख्या देवांना सुध्दा ज्ञानाचा लाभ होणे कठीण आहे .ज्ञानाचा लाभ साधुसंतांच्या संगतीत सुलभपणे होऊ शकतो. साधूंच्या संगतीत राहून साधूसारखे विरक्त होणे हीच ज्ञानाची खूण आहे असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--९५'''
माजी बांधावा भोपळा । तैसी बांधो नये शिळा
घेऊ येते तेचि घ्यावें। येर अवघेचि सांडावें
विषवल्ली अमरवल्ली। अवघी देवेचि निर्मिली
दास म्हणें हरिजन । धन्य जाण ते सज्जन
'''भावार्थ--'''
पाण्यामध्ये पोहण्यासाठी भोपळा बांधावा दगड बांधू नये. विष वेली व अमवेली या दोन्ही देवानेच निर्माण केल्या आहेत पण आपल्याला योग्य असेल तेच स्वीकाराव.
बाकी सर्व सोडून द्यावे. असे सांगून संत रामदास म्हणतात हरिभक्त हे संतजन असून त्यांच्या संगतीचा लाभ घ्यावा.
'''अभंग--९६'''
भाग्यवंत नर यत्नासी तत्पर। अखंड विचार चाळणांचा
चाळणेचा यत्न यत्नाची चाळणा।अखंड शाहाणा तोचि एक
प्रव्रुत्ति निव्रुत्ति चाळणा पहिजे। दास म्हणे कीजे विचारणा
'''भावार्थ--'''
जे सतत प्रयत्नशील असतात ते पुरुष भाग्यवंत असतात.तें सतत सद्विवेक बुद्धीचा उपयोग करून योग्य व अयोग्य गोष्टींची निवड करीत असतात.केलेल्या प्रयत्नांचे यश अपयश याबद्दल अत्यंत सुज्ञपणे सावध असतात.संत रामदास म्हणतात प्रवृत्ती वझ निवृत्ती यांची निवड करू शकणारा या जगात शाहाणा ठरतो.त्याचा विचार करावा.
'''अभंग--९७'''
नमू रामक्रुष्णा आदिनारायणा। तुम्ही त्या निर्गुणा दाखवावें
दाखवावे निजस्वरुप आपुँलें। दिसेनासे जालें काय करू
पांडुरंगा देवा अगा महादेवा। तुम्ही मज द्यावा ठाव ब्रह्मीं
ब्रह्मी ब्रह्मरुप ते मज करावें । रामदास भावें प्रार्थितसे
'''भावार्थ--'''
संत रामदास राम-कृष्णांना वंदन करून त्या देवतांना प्रार्थना करतात की त्यांनी त्यांचे निर्गुण निजस्वरूप प्रकट करून दाखवावे कारण सगुणाच्या भक्तीमुळे निर्गुणाचे स्वरूप दिसेनासे झाले आहे.पांडुरंगाला अत्यंत भाविकपणे प्रार्थना करतात की त्यांनी आपल्याला ब्रह्मरूप बनवून ब्रम्ह रुपात विलीन करावें.
'''अभंग--९८'''
सूर्यनारायणा देवा नमस्कार। तुवां निराकार दाखवावें
दाखवुनी द्यावें मज निववावें ।चंद्रा तुज भावें प्राथितसें
प्राथितसें मही आणि अंतरिक्षा। तुम्ही त्या अलक्षा दाखवावें
दाख़वावें मज आपोनारायणें। ब्रह्मप्राप्ति जेणें तें करावें
करावे सनाथ अग्निप्रभंजने। नक्षत्रे वरुणें दास म्हणे
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास सूर्यनारायणाला नमस्कार करून त्यांनी आपल्याला निराकार रूप साकार करून दाखवावे अशी विनंती करतात.चंद्राने शितल रूप दाखवून आपणास शांत करावे अशी भावपूर्ण प्रार्थना करतात। पृथ्वी आकाश आप तेज वायू अग्नी या पंचमहाभूतांनी आपल्या अलक्ष रूपाचे प्रकटीकरण करून ब्रह्म प्राप्तीचा मार्ग दाखवावा अशी विनंती करीत आहेत.
'''अभंग--९९'''
तुम्ही सर्व देव मिळोनी पावावें। मज वेगीं न्यावें परब्रहमीं
परब्रह्मीं न्यावें संतमहानुभावें। मज या वैभवें चाड नाहीं
चाड नाही एका निर्गुणावांचोनी। माझे ध्यानीं मनीं निरंजन
निरंजन माझा मज भेटवावा। तेणें होय जीवा समाधान
समाधान माझें करा गा सर्वहो। तुम्हांसी देव हो विसरेना
विसरेना देह चालतो तोंवरी। बाह्य अभ्यंतरी दास म्हणे
'''भावार्थ--'''
सर्व देवांनी तसेच संत महानुभावांनी कृपा करून आपल्याला परब्रह्मस्वरूपी न्यावे अशी प्रार्थना संत रामदासांनी या अभंगात केली आहे.आपल्याला एका निर्गुण निराकार परब्रम्हा शिवाय कोणत्याही वैभवाची अपेक्षा नाही. आपल्या ध्यानीमनी केवळ निरंजन परमेश्वर वसत असून तेच निरंजन स्वरुप डोळ्यांनी पाहावे हेच आपल्या मनाचे समाधान आहे.सर्व देवांनी हे समाधान मिळवून दिल्यास देहात चलनवलन असे पर्यंत हा उपकार आपण विसरणार नाही व बाह्य व अंतर्यामी सतत चिंतन करीत राहिल असे संत रामदास प्रतिज्ञापूर्वक सांगत आहेत.
'''अभंग--१००'''
मन हे विवेके विशाळ करावें। मग आठवावे परब्रह्म
परब्रह्म मनीं तरीच निवळे। जरी बोधें गळे अहंकार
अहंकार गळे संतांचे संगतीं। मग आदि अंतीं समाधान
समाधान घडे स्वरुपीं राहतां विवेक पाहतां नि:संगाचा
नि:संगाचा संग सदृढ धरावा।संसार तरावा दास म्हणे
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास संसार सागर कसा तरून जावा याविषयी मार्गदर्शन करीत आहेत. विवेकाने मन विशाल करावे आणि मग परब्रह्माचे स्वरूप आठवावे. जेव्हा पूर्ण बोध
होऊन अहंकार गळून जाईल तेव्हाच परब्रम्हाचे दर्शन मनामध्ये प्रतिबिंबित होईल .अहंकार गळण्यासाठी संतांची संगती धरावी त्यामुळे जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत समाधान टिकून राहते.स्वतःच्या आत्मस्वरूपात मन स्थिर झाल्यानंतरच समाधानाची प्राप्ती होते.देहबुद्धी व त्यामुळे घडणाऱ्या विषयाचा संग यापासून दूर राहणाऱ्या संतांची संगत दृढपणे धरावी. तरच त्यांचे विवेक व वैराग्य कळून येते,त्यामुळे संसारसागर सहज तरुन जाता येतो असे संत रामदास सांगत आहेत.
'''अभंग--101'''
कल्पनेच्या देवा कल्पनेची पूजा। तेथें कोणी दुजा आढळेना
आढळेना देव आढळेना भक्त। कल्पनेरहित काय आहे
आहे तैसे आहे कल्पना न साहे। दास म्हणे पाहे अनुभवें
'''भावार्थ--'''
भक्त आपल्या मनात आवडणाऱ्या देवाची कल्पनेने मूर्ती साकार करतो आणि कल्पनेनेच कल्पनेतल्या देवाची षोडशोपचारे पूजा करतो.प्रत्यक्षात देव व भक्त दोन्हीही आढळत नाही कल्पनेशिवाय काहीच घडत नाही.संत रामदास म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन पहावा.
'''अभंग --102'''
विदेशासी जातां देशचि लागला। पुढें सांपडला मायबाप
सर्व देशीं आहे विचारें पाहतां। जाता न राहता सारिखाची
व्यापुनियां दासा सन्निधचि असे। विचारें विलसे रामदासीं
'''भावार्थ--'''
देशत्याग करुन विदेशात जाण्याचे ठरवले तर पुढेही आपलाच देश लागला.आणखी मार्गक्रमणा केले तरी आपलेच मायबाप आढळले. विचार केला तर सर्व देश सारखेच आहेत हे लक्षात आल.सगळीकडे एकच तत्व व्यापून आहे हा विचार या अभंगात संत रामदास साधकांचे.
'''अभंग --103'''
मनाहूनि विलक्षण । तेंचि समाधिलक्षण
नलगे पुरुनी घ्यावें। नलगे जीवेंचि मरावे
अवघा वायु आटोपावा। नलगे ब्रम्हांडासी न्यावा
डोळे झाकूनि बैसला। परि तो मनें आटोपिला
नाना साधनीं सायास। मनें केला कासाविस
रामदास म्हणे वर्म। हेंचि मनाचें सुगम
'''भावार्थ--'''
संत रामदास या अभंगात म्हणतात की समाधी लक्षण मनासारखेच विलक्षण आहे.समाधी साधताना साधकाला पुरुन घ्यावे लागत नाही की जिवंतपणी मरावे लागत नाही. वायूचा निरोध करून ब्रह्मांडात न्यावा लागत नाही त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या साधना व त्यासाठी नाना प्रयत्न करताना मनाच्या चंचलपणा पुढे काही उपाय सापडत नाही. जीव कासाविस होतो. चंचलता हे मनाचे वर्म समजून घेतले पाहिजे तरच साधकाची साधना सफल होऊ शकते
'''अभंग--104'''
दृढ होतां अनुसंधान। मन जाहलें उन्मन
होता बोधाचा प्रबोध । जाला शब्दांचा नि:शब्द
ज्ञान विज्ञान जाहलें ।वृत्ति निवृत्ति पाहिलें
ध्यानधारणेची बुध्दि । जाली सहज समाधि
रामीरामदासीं वाच्य ।पुढें जालें अनिर्वाच्य
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास साधकाचे अनुसंधान म्हणजे मनाची एकाग्रता साधली असता कोणते अनुभव येतात याचे मार्गदर्शन करतात ते म्हणतात साधनेत दृढ एकाग्रता साधली तर मनाचे उन्मन होते म्हणजे मन विचारांच्या उच्च पातळीवर जाते.मनाला झालेला बोध केवळ शाब्दिक न राहता त्याचा प्रबोध होतो म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर येतो. तेथे शब्दाचे काही प्रयोजन रहात नाही मन निशब्द बनते. ज्ञानाचे विज्ञान म्हणजे ते शाब्दिक न राहता प्रत्यक्ष व्यवहारात उतरवता येते. साधकाच्या सहजप्रवृत्ती निवृत्तीत बदलतात. मन समाधी अवस्थेपर्यंत पोचते जेथे स्वतःचा व जगाचा विसर पडतो अपूर्व शांतता अनुभवास येते.संत रामदास म्हणतात मन रामरुपाशी एकरुप झाले की,तो अनुभव शब्दात सांगता येत नाही,मन शब्दातित होते.
संत रामदास म्हणतात ram रूपाशी एकरूप झाले की तो अनुभव शब्दात सांगा सांगता येत नाही मन शब्दातीत होते मनाचे मनाशी संत रामदासांच्या मनात विलसू लागला
'''अभंग --105'''
ज्ञानेविण जे जे कळा । ते ते जाणावी अवकळा
ऐसें भगवंत बोलिला । चित्त द्यावें त्याच्या बोला
एक ज्ञानचि सार्थक । सर्व कर्म निरर्थक
दास म्हणे ज्ञानेविण । प्राणी जन्मला पाषाण
'''भावार्थ--'''
ज्ञानाशिवाय माणसाचे सर्व प्रयत्न ,सर्व कला केवळ अवकळा आहेत असे प्रत्यक्ष भगवंताने सांगितले आह, त्याचा विचार करावा असे संत रामदास म्हणतात. ज्ञान हेच जीवनाचे सार्थक असून त्याशिवाय सर्व कर्म निरर्थक ठरते.संत रामदास म्हणतात, ज्ञाना शिवाय मनुष्य हा केवळ दगड होय.
'''अभंग--106'''
कोणें प्रारब्ध निर्मिलें। कोणें संसारीं घातलें
ब्रह्मादिकांचा निर्मिता । कोण आहे त्या परता
अनंत ब्रह्मांडांच्या माळा । विचित्र भगवंताची कळा
रामदासांचा विवेक । सर्वा घटीं देव एक
'''भावार्थ--'''
अनंत ब्रम्हांडाच्या मालिका ज्याने निर्माण केल्या, ब्रह्मादिक देवांचा jजो निर्माता आहे ,ज्याच्या पेक्षा श्रेष्ठ असा कुणीही नाही ,ज्याने या संसारात प्राणी सृष्टी उत्पन्न केली व त्यांचे प्रारब्ध निर्माण केले .या सर्व लीला एका भगवंताच्या आहेत. संत रामदास सांगतात अनंत प्राण्यांच्या देहात एकच परमात्मा विलसत आहे हे समजून घेणे हाच खरा विवेक आहे.
'''अभंग--107'''
पतित म्हणजे वेगळा पडिला । पावन तो जाला एकरुप
एकरुप देव अरुप ठायींचा । तेथे दुजा कैंचा कोण आहे
कोण आहे दुजा स्वरुपीं पाहतां ।विचारें राहतां सुख आहे
सुख आहें मूळ आपुलें शोधितां ।मनासी बोधितां रामदास
'''भावार्थ--'''
जो स्वरुपापासून वेगळा झाला तो पतित व जो स्वरुपाशी एकरुप झाला तो पावन असे संत रामदास म्हणतात.स्वरुपाशी पूर्पपणे एकरुप झाल्यास तेथे मी तू पणाचा भेद राहत नाही मुळांत आपण अमृताचे पुत्र आहोत. एकाच आत्मतत्वातून जन्माला आलो आहोत आणि ते आत्मत्त्व अमर आहे.असा विचार करण्यात फार सुख आहे.संत रामदास म्हणतात,हाच बोध मनाने स्विकारला पाहिजे.
'''अभंग--108'''
कर्ता तूं नव्हेसी करवितानव्हेसी।जाण निशचयेसी आलया रे
चंद्रसूर्यकळा धरा मेघमाळा। जीववीति कळा देवापासीं
देवें केलें अन्न केलें तें जीवन। तेणें पंचप्राण स्थिर जाले
दास म्हणे मना तुज देवें केलें। मग त्वां देखिलें सर्वकाहीं
'''भावार्थ--'''
म्हणूस स्वतः करता किंवा करविता नाही ही गोष्ट निश्चयपूर्वक जाणून घ्यावी असे संत रामदास म्हणतात. चंद्र-सूर्य ,मेघ मालिका पृथ्वी हे सर्व ईश्वरानें निर्माण केले आहे. जीवनास आवश्यक असलेले, पंचप्राण स्थिर करणारे अन्न व पाणी हे सर्व देवाने निर्माण केले आह. एवढेच नव्हे तर असा विचार करणारे मन ही देवाचीच देणगी आहे. त्यामुळेच आपण सर्व काही समजून घेऊ शकतो असे रामदास म्हणतात.
'''अभंग--109'''
करुनी अकर्ते होऊनियां गेले ।तेणे पंथें चाले तोचि धन्य
तोचि धन्य जनीं पूर्ण समाधानी।जनीं आणि वनीं सारिखाचि
कळतसे परी अंतर शोधावें ।मनासि बोधावें दास म्हणें
'''भावार्थ--'''
स्वतः सर्व काही करूनही स्वतःकडे कर्ते पणा घेणारे अनेक अकर्ते होऊन गेले आहेत ते लोक समुदायात असोत अथवा वनात एकांतात असोत पूर्ण समाधानात राहातात .संत रामदास म्हणतात अशा लोकांचे अंतरंग ,त्यांचे विचार समजून घेऊन त्या पासून योग्य तो बोध घ्यावा.
'''अभंग--110'''
गगना लावू जातां पंक। लिंपे आपुला हस्तक
ऊर्ध्व थुंकता अंबरीं । फिरोनि पडे तोंडावरीं
ह्रदयस्थासी देतां शिवी। ते परतोनी झोंबे जिवीं
प्रतिबिंबासी जें जे करी। तेंआधींच तोंडावरी
रामीरामदासी बुद्धि । जैसी होय तैसी सिद्धि
'''भावार्थ--'''
आपण आकाशाला चिखल लावायला लागलो तर आपलेच हात चिखलाने माखून निघतात. वर तोंड करून आकाशावर थुंकलो तर ते परत आपल्याच तोंडावर पडते.आपल्या ह्रदयांत वास करणाय्राला अभद्र शब्द वापरले तर ते परतून आपल्याच मनाला दुःख देतात .रामदास म्हणतात जशी आपली बुद्धी तशी सिद्धी आपणास प्राप्त होत.
'''अभंग--111'''
राघवाचे घरीं सदा निरुपण । श्रवण मनन निजध्यास
विचारणा सारासार थोर आहे। अनुभवे पाहें साधका रे
साधका रे साध्य तूंचि तूं आहेसी। रामीरामदासीं समाधान
'''भावार्थ--'''
राघवाच्या घरी धार्मिक ग्रंथांचे सतत श्रवण मनन व निरुपण अखंड चालू असते.हाच केवळ एकच ध्यास असतो. सारासार विचारांचे मंथन सुरू असते असे सांगून संत रामदास म्हणतात याचा अनुभव स्वतः साधकाने घ्यावा. साधकाच्या जीवनाचे सार्थक हेच साध्य मानले जाते.त्यातच खरे समाधान मिळते असे संत रामदास सांगतात.
'''अभंग--112'''
स्वस्कंधी बैसणें आपुलिये छाये। अघटित काय घडो शके
दुजेविण सुखें स्वरुप बोलणे ।अद्वैतासी उणे येऊं पाहे
सुख आणि दु:ख वृत्तीच्या संबंधें। निवृत्तीच्या बोधें द्वंद्व कैचे
सुखातीत देव पहावा अनंत। दास म्हणे संत वृत्तिशून्य
वृत्तिशून्य संत असोनिया वृत्ति। हेखूण जाणती अनुभवी
'''भावार्थ'''
आपल्याच सावलीच्या खांद्यावर बसता येणे ही गोष्ट अशक्य असते.असे कधी घडले नाही.दुसरा कोणी नसताना स्वरूपाविषयी सुखाने संवाद होऊ शकत नाही. तेथ द्वैत निर्माण होते व त्यामुळे अद्वैताला कमीपणा येतो.सुखव दुःख हे दोन्ही आपल्या वृक्तिशी संबंधित आहेत. जेथे सुखदुःखाची जाणीवच नाही तेथे द्वंद्व संपूर्ण जाते.सुखाच्या अतीत असलेला अनंत परमेश्वराचे दर्शन घ्यावे.तो निराकार निरंजन आहे. संत रामदास म्हणतात संत वृत्तिशुन्य असतात. त्यांच्ये मन शांत सरोवरा सारखे असते.त्यांच्या मनात वृत्ति उठत नाहीत तरीही त्यांना देवदर्शनाची, रामरूपाची अत्यंत गोडी वाटते.अनुभवाशिवाय हे जाणता येणार नाही असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग --113'''
बोलवेना तें बोलावे।चालवेना तेथें जावें
नवल स्वरुपाचा योग ।जीवपणाचा वियोग
हातां नये तेचि घ्यावें । मनेंवीण आटोपावें
रामदासीं दृढ बुध्दि ।होतां सहज समाधि
'''भावार्थ--'''
जे बोलता येणार नाही ते बोलावे करता येण्याजोगे नाही ते करण्याचा प्रयत्न करावा.जेथ पर्यंत चालत जाता येत नाही तेथे जावे.अशा ठिकाणी नवलाईच्या गोष्टींचा योग येतो. तेथे जीवपणा संपूर्ण जातो.जीवा शिवाचे मिलन होते.जे आपल्या हातात येत नाही ते घेण्याचा प्रयत्न करावा.संत रामदास म्हणतात सहज समाधीच्या अवस्थेत बुद्धी दृढ होत.
'''अभंग--114'''
माझे मी तूं पण विवेकाने नेलें।देवाजीने केलें समाधान
आपुल्या सुखाचा मज दिला वाटा।वैकुंठीचा वाटा कोण धांवे
देवासी नेणतां गेले बहु काळ ।सार्थकाची वेळ एकाएकी
एकाएकीं एक देव सांषडला। थोर लाभ झाला काय सांगों
'''भावार्थ--'''
मी तूंपणाचे द्वैत विवेकामुळे नाहिसे झाले. आपल्या सुखाचा वाटा देऊन देवाने सुखी केले.देवाला जाणून घेण्याच्या प्रयत्नात खूप दिवस निघून गेले पण जीवनाचे सार्थक होण्याची वेळ अकस्मात आली .आणि वैकुंठीच्या वाटा सापडल्या.तेथे एकाएकी देव सापडला मोठा लाभ झाला याचे वर्णन करून सांगता येणार नाही.
'''अभंग--115'''
योगियांचा देव मज सांपडला।थोर लाभ जाला एकाएकीं
एकाएकीं एक त्रैलोक्यनायक ।देखिला सन्मूख चहुंकडे
चहुंकडे देव नित्यनिरंतर । व्यापुनी अंतर समागमें
समागम मज रामाचा जोडला । वियोग हा केला देशधडी
देशधडी केला विवेके वियोग । रामदासीं योग सर्वकाळ
'''भावार्थ --'''
संत रामदास म्हणतात यगेश्वर एकाएकी डोळ्यासमोर प्रगट झाला आणि आश्चर्य असे की योगेश्वराचे रूप चारी बाजूंनी नित्य निरंतर दिसू लागले.रामरुपाने देव भक्तामधील सर्व अंतर व्यापून टाकले आणि समागमाचे सुख मिळाले. रामाचा समागम झाल्यामुळे वियोगाचं दुःख संपले. विवेकाने वियोगाचे दु:ख लयाला जावून श्रीरामाचा कायमचा सर्वकाळ योग प्राप्त झाला.
'''अभंग --116'''
राघवाचा धर्म गाजो। कीर्ति अद्भुत माजो
ठाईं ठाईं देवालयें । भक्तमंडळी साजो
शक्ति आहे तोचि फावे । दोनी लोक साधावे
इहलोक परलोक ।शत्रु सर्व रोधावे
संसारिचें दु:ख मोठें । हें मी कोणाला सांगों
जन्म गेला तुजविण । आणिक काय मी मागों
मागता समर्थाचा । तेणें कोणा सांगावें
रामेविण कोण दाता । कोणामागे लागावें
रामदास म्हणे देवा । आतां पुरे संसार
असंख्य देणे तुझें । काय देतील नर
'''भावार्थ--'''
या अभंगाचा प्रारंभी संत रामदासांनी राघवाचा धर्म गाजत राहो राघवाची कीर्ती दुमदुमत राहो ठिकठिकाणी राममंदिरांची स्थापना केली जावो अनेक भक्तांमुळे ती मंदिरे शोभायमान होवोत अशी मंगल प्राथना करीत आहेत. आपण बलोपासना करावी ,सर्व शत्रूंना शक्तीच्या प्रभावाने रोखावे ,व अशाप्रकारे इहलोक व परलोक साधावे असा उपदेश रामदास करतात.अगणित दुखे भोगावी लागली रामा शिवाय जन्म गेला हे आपण कुणाला सांगू शकत नाही. आणि समर्थचा दास असल्याने कुणाला काही मागू शकत नाही असे रामदास म्हणतात.
'''अभंग --117'''
वदन सुहास्य रसाळ हा राघव । सर्वांगी तनु सुनीळ हा राघव
मृगनाभी रेखिला टिळा हा राघव।मस्तकीं सुमनमाळा हा राघव
साजिरी वैजयंती हा राघव ।पायीं तोडर गर्जती हा राघव
सुंदर लावण्यखाणी हा राघव । उभा कोदंडपाणी हा राघव
सकल जीवांचें जीवन हा राघव।रामदासासि प्रसन्नहा राघव
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास रामाचे रसाळ वर्णन करीत आहेत रामाच्या वदनावर सुहास्यअसून तो लावण्याची खाणी आहें. राघवाच्या कपाळावर टिळा लावला आहे .मस्तकावर सुवासिक फुलांच्या माळा आहेत.गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे.पाया मध्ये तोड गाजताहेत.हातामध्ये कोदंड धारण केला आहे. राघव जीवांचे जीवन आहे आणि विशेष म्हणजे राघव रामदासांवर प्रसन्न आहे.
'''अभंग--118'''
कुळ हनुमंताचें । मोठे किराण त्यांचें
भुभुकारें ँळळजयाचें । किलकिलाटें
आतां वाटतें जावें। त्याचें सांगाती व्हावें
डोळे भरुनी पहावें । सर्वांग त्यांचें
ऐकोनी हासाल परी । नये तयांची सरी
विचार जयांसी करी । स्वामी माझा
असंख्य मिळाला मेळा । रामा भोंवता पाळा
पालथें या भूगोळा । घालू शकती
ऐसी करणी त्यांची । व्यर्थ जिणीं आमुचीं
पाला खाउनी रामाची । शुश्रुषा केली
ऐसे ते रामदास । सर्वस्वे उदास
रामीं जयांचा विश्वास । बाणोनि गेला
'''भावार्थ--'''
संत रामदास म्हणतात हनुमंताचे कुळ प्रसिद्ध आहे त्यांच्या भुभुकाराने,किलबिलाटाने सर्व परिसर व्यापून राहिला आह.असे वाटते की आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांचे सांगाती व्हावे.त्यांना डोळे भरून पाहावे.हे ऐकून कुणाला हसायला येईल परंतु त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही कारण प्रत्यक्ष श्रीराम त्यांच्याशी विचारविनिमय करत असत. श्रीरामा सभोवती ती वानरसेना वेढा घालीत अस. आपल्या शक्तीने या भूगोलोकाला पालथा घालू शकतील एवढी त्यांची शक्ती होती. केवळ झाडाचा पाला खाऊन त्यांनी राघवाची सेवा केली ही त्यांची करणी आपल्याला आपले जीवन व्यर्थ ,लाजिरवाणें आहे असे वाटायला लावते. ते रामाचे दास असून वृत्तीने अत्यंत उदासीन आहेत. शिवाय त्यांना कसलीच अपेक्षा नाही. रामावर त्यांचा दृढ विश्वास आहे.त्यांच्या भक्तीची सर कुणालाच येणार नाही. असा आपला स्वामी हनुमंत आहे असे रामदास म्हणतात.
'''अभंग--119'''
देव वैकुंठीचा । कैपक्षी देवाचा
भार फेडिला भूमीचा । आत्मा सर्वांचा
पाळक प्रजाचा । योगी योगियांचा
राजा सूर्यवंशींचा । तो अयोध्येचा
राम सामर्थ्याचा । कैवारी देवांचा
मेघ वोळला सुखाचा । न्यायनीतीचा
उध्दार अहिल्येचा । एकपत्नीव्रताचा
सत्य बोलणे वाचा । जप शिवाचा
नाथ अनाथांचा । स्वामी हनुमंताचा
सोडविता अंतीचा । रामदासाचा
'''भावार्थ--'''
श्रीराम हा वैकुंठीचा देव असून देवांचा कैवारी आहे तो सर्वांचा आत्मा असून धरणीचा भार हलका करण्यासाठी सूर्यवंशात अवतार धारण केला आहे.प्रजेचा पालनकर्ता असून योग्यामधील सर्वश्रेष्ठ योगी आहे .श्री राम अयोध्येचा राजा असून अत्यंत सामर्थ्यवान आहे .आपल्या प्रजेला न्याय नीती व सुख देणारा मेघ च आहे.अहिल्येचा उद्धारकर्ता ,एकपत्नी ,सत्यवादी आहे .रामनामाचा जप स्वतः शिवशंकर करतात.प्रभू रामचंद्र अनाथांचे नाथ असून हनुमंताचे स्वामी आहेत. संत रामदास म्हणतात श्रीराम हा अंतकाळी सुटका करणारा मोक्षदाता आहे.
'''अभंग--120'''
कैवारी हनुमान,आमुचा ।।
पाठी असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान
नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरुनियां अभिमान
द्रोणागिरि करि घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान
दासानुदासा हा भरंवसा । वहातसे त्याची आण
'''भावार्थ--'''
संत रामदास या अभंगात हनुमानाचा महिमा सांगत आहेत. ते म्हणतात हनुमान निरंतर रक्षण करणारा आपला कैवारी आहे .लक्ष्मणाच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी तो द्रोणागिरी सारखा पर्वत तळहातावर घेऊन आला. संत रामदास म्हणतात हनुमंता सारखा जगाचे रक्षण करणारा जगजेठी पाठीशी असताना आणखी कशाचीच अपेक्षा करण्याचे कारण नाही.त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा.
'''अभंग--121'''
घात करा घात करा । घात करा ममतेचा
ममतागुणें खवळें दुणें ।राग सुणें आवरेना
ममता मनीं लागतां झणीं । संतजनीं दुरावली
दास म्हणे बुध्दि हरी । ममता करी देशधडी
'''संदर्भ--'''
या अभंगात संत रामदास ममतेचा घात करा असे सांगत आहेत .ममता म्हणजे माझे पणा किंवा ममत्व त्यामुळे माझे व दुसऱ्याचे असा दुजाभाव वाढीस लागतो .त्यामुळे क्रोध आवरणे कठीण होते.मनात ममत्व निर्माण झाले की संतांचा उपदेश आवडेनासा होतो परिणामी संतजन दुरावतात. संत रामदास म्हणतात बुद्धी हरण करणारी ममता मनातून काढून टाकावी तिला देशोधडीला लावावें.
'''अभंग--122'''
सखियेहो आहेति उदंड वेडे । ऐसे ते सज्जन थोडे
तयाची संगति जोडे । परम भाग्यें
सकळांचे अंतर जाणे । मीपणें हुंबरों नेणें
ऐसियावरून । प्राणसांडण करुं
साहती बोलणें उणें । न पुसतां सांगणें
समचि देखणें उणें । अधिक नाहीं
अभिमान नावडे । धांवती दीनांकडे
तयांचे जे उकरडे । महाल त्यांचे
आपपर नाही ज्यासी ।पुसतां सांगती त्यासी
ऐकतांचि भाविकांसी । पालट होये
रामीरामदास। वास । पाहतो रात्रंदिस
ऐसियाचा सौरस । देईं राघवा
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास संतांचा महिमा सांगत आहे .ज्यांना रामभक्तीचे उदंड वेड लागले आहे असे सज्जन अगदीच थोडे असतात. मोठ्या भाग्याने त्यांच्या संगतीचा लाभ होतो. ते सर्वांच्या अंतकरणातील विचार जाणतात. अहंकाराने कधीच गुरगुरत नाहीत .अशा संत-सज्जनां वरुन आपले प्राण ओवाळून टाकावेत असे संत रामदास म्हणतात .अज्ञानी लोकांचे कठोर भाषण सहन करतात. त्यांच्या गुणदोषांची चर्चा करीत नाहीत. कुणीही विचारल्याशिवाय समजुतीच्या गोष्टी सांगतात .ते सर्वांना समभावाने वागवतात। जे दीनदुबळे आहेत त्यांच्याकडे धाव घेतात .अभिमान ,गर्विष्ठपणा त्यांना अजिबात आवडत नाही .सज्जन कधी आपला व परका असा दुजाभाव करीत नाहीत .भाविक लोक संतांचा उपदेश ऐकताच त्यांच्या विचारात बदल घडून येतो .संत रामदास म्हणतात आपण रात्रंदिवस या संतांची वाट पाहतो व त्यांची संगती घडवून आणावी अशी राघवाला प्रार्थना करतो.
'''अभंग--123'''
शहाणें शोधितां नसे । दुष्काळ पडिला असे
तया धुंडितसे मन माझें रे
आहेति थोर थोर। परि नाहीं चतुर ।
तेथें निरंतर मन माझें रे
भेदिक शाहाणे जनी । सगुण समाधानी
धन्य धन्य ते जनीं कुळखाणी रे
रामीरामदासीं मन । जाहलें उदासीन
ऐसे ते सज्जन पहावया रे
'''भावार्थ--'''
संत रामदास म्हणतात जगात अनेक थोर माणसे आहेत पण अत्यंत चतुर,विवेकी,समाधानी व सद्गुणी सज्जन मात्र नित्य,निरंतर शोधूनही सापडत नाहीत.असें सज्जन ज्या कुळात जन्म घेतात ते कुळ धन्य होय.अशा संत सज्जनांचा शोध घेताना आपले मन उदासीन झाले आहे.
'''अभंग--124'''
साधुसंतां मागणें हेंची आतां । प्रीति लागो गोविंदगुण गातां
वृत्ति शून्य जालीया संसारा । संतांपदीं घेतला आम्हीं थारा
आशा तृष्णा राहिल्या नाहीं कांहीं । देहप्रारब्ध भोगितां भय नाहीं
गाऊं ध्याऊं आठवूं कृष्ण हरी । दास म्हणे सप्रेम निरंतरीं
'''भावार्थ --'''
या अभंगात रामदास साधुसंतांकडे एक मागणे मागत आहेत .त्यांनी आपल्या मनामध्ये गोविंदाचे गुण गाण्यासाठी प्रेम निर्माण करावे .सांसारिक सुखदुःखा मुळे वृत्ती शून्य झाल्याने मनातील आसक्ती ,आशा ,तृष्णा यांचा लोप झाला आहे .आता देहबुद्धीमुळे भोगायला लागणारे प्रारब्धाचे भोग राहिले नाही .उदासीन वृत्ती निर्माण झाल्याने संतपदी आश्रय घेऊन गोविंदाचे गुण आठवून त्याचे कीर्तन करावे व त्याविषयी अंतरात निरंतर प्रेम असावे एवढी एकच इच्छा उरली आहे, ती साधुसंतांनी पूर्ण करावी अशी याचना संत रामदास करतात.
'''अभंग--125'''
पावनभिक्षा दे रे राम ।दीनदयाळा दे रे राम
अभेदभक्ति दे रे राम ।आत्मनिवेदन दे रे राम
तद्रूपता मज दे रे राम । अर्थारोहण दे रे राम
सज्जनसंगति दे रे राम । अलिप्तपण मज दे रे राम
ब्रह्मानुभव दे रे राम । अनन्य सेवा दे रे राम
मजविण तूं मज दे रे राम । दास म्हणे मज दे रे राम
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास श्रीरामा जवळ पावन भिक्षा मागताहेत कोणताही संदेह नसलेली भक्ती ,नवविधा भक्तीमध्ये अगदी शेवटची आत्मनिवेदन भक्ती ,कोणत्याही विषयाशी एकरूप होऊन त्यातील अर्थ ग्रहण करण्याची शक्ती, सज्जनांची संगती ,केवळ साक्षीभावाने अलिप्तपणे येणारा ब्रह्मानुभव, स्वामींची अनन्य भावाने सेवा करण्याची वृत्ती श्री रामाने आपणांस द्यावी अशी प्रार्थना करून शेवटी संत रामदास म्हणतात ,माझ्या मीपणाचे, अहंकाराचे विसर्जन करून श्रीरामाने आपल्याला भेट द्यावी.
'''अभंग--126'''
कोमळ वाचा देरे राम । विमळ करणी दे रे राम
हितकारक दे रे राम । जनसुखकारक दे रे राम
अंतरपारखी दे रे राम । बहु जनमैत्री दे रे राम
विद्या-वैभव दे रे राम । उदासिनता दे रे राम
मागो नेणें दे रे राम । मज न कळे तें दे रे राम
तुझी आवडी दे रे राम । दास म्ह्णे मज दे रे राम
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास जे लोकांसाठी हितकारक, सुखकर ,सुखदायक आहे अशा गोष्टींची रघुनायका कडे मागणी करीत आहेत.आपली वाणी कोमल व कृती निर्मळ असावी असे ते म्हणतात.आपल्याला इतरांचे अंतरंग जाणून घेण्याची कला द्यावी त्यामुळे लोकांची अतूट मैत्री मिळवता येईल असे संत रामदास म्हणतात.वैभवा बरोबरच ते अंतकरणाची उदासीनता मागताहेत.अभंगाचे शेवटी रामदास म्हणतात की आपल्याला काय मागावे हे कळत नाही पण तेच रामाने आपल्याला द्यावें आणि रामाचे प्रेम सतत हृदयात रहावें अशी मागणीही ते करतात.
'''अभंग--127'''
संगित गायन दे रे राम । आलाप गोडी दे रे राम
धात माता दे रे राम । अनेक धाटी दे रे राम
रसाळ मुद्रा दे रे राम । जाड कथा दे रे राम
प्रबंध सरळी दे रे राम । शब्द मनोहर दे रे राम
सावधपण मज दे रे राम । बहुत पाठांतर दे रे राम
दास म्हणे रे गुणधामा । उत्तम गुण मज दे रे राम
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास गुंणधाम रामाकडे उत्तमगुणांची मागणी करीत आहेत. मधुर संगीत ,गायन करताना मुद्रेवर दिसणारे रसाळ भाव ,मनोहर शब्दांनी सजवलेली आकर्षक कथा याबरोबरच व्यवहारातील नित्य सावधपणा व विपुल पाठांतर हे सर्व गुण आपल्याला द्यावेत असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--128'''
अपराध माझा क्षमा करीं रे श्रीरामा
दुर्लभ देह दिधले असतां नाहीं तुझिया प्रेमा
व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं जन्मुनि मेलों रिकामा
नयनासारिखें दिव्य निधान पावुनियां श्री रामा
विश्वप्रकाशक तुझे रुपडें न पाहें मेघश्यामा
श्रवणें सावध असतां तव गुणकीर्तनि त्रास आरामा
षड्रसभोजनि जिव्हे लंपट नेघे तुझिया नामा
घ्राण सुगंध हरुषें नेघे निर्माल्य विश्रामा
करभूषणें तोषुनि नार्चिति तव स्वरुपा गुणधामा
मस्तक श्रेष्ठ हें असतां तनुतें न वंदीं पदपद्मा
दास म्हणे तूं करुणार्णव हे सीतालंकृतवामा
'''भावार्थ--'''
संत रामदासांच्या हा अभंग धावा या स्वरूपाचा आहे. माणसाला दुर्लभ मनुष्य देह मिळूनही विषय वासनेमुळे श्रीरामाच्या प्रेमाला आपण पारखे झालो आहोत.मनुष्य जन्माला येऊन आयुष्य व्यर्थ घालविले असा पश्चात्ताप संत रामदास व्यक्त करतात.नयना सारखी दिव्य देणगी मिळूनही विश्वाला प्रकाशित करणाऱ्या मेघश्याम राम दर्शनाचे सुख आपणास लाभले नाही याबद्दल ते खंत व्यक्त करतात.सावध कर्णेंद्रिय मिळूनही रामगुण कीर्तनाचा लाभ झाला नाही.सहा प्रकारच्या रसांनी युक्त असलेल्या भोजनासाठी लंपट असलेली जीभ रामनामाचा जप करण्यास मात्र विसरली. सुवासिक फुलांचा ,फळांचा सुगंध घेण्यास चटावलेली श्रवणेंद्रिय श्रीरामाच्या पदकमली वाहिलेल्या निर्माल्याचा सुगंध चाखू शकली नाही.सुवर्ण भुषणांनी सुखावलेल्या हातांनी कधी रामाची पूजा केली नाही.सर्वश्रेष्ठ अशा मस्तकाने कधी रामाचा पदकमलांना वंदन केले नाही.अशा असंख्य अपराधांना दयाघन श्रीरामानें क्षमा करावी असे संत रामदास विनवणी करून अत्यंत कृपाळूपणे ही आस पुरवावी असे सांगतात.
'''अभंग--129'''
शरण तुज रघुवीरा । हो रामा ,गुणगंभीरा
धन्य धन्य दातारा । कृपाळू खरा
जन्मदु:ख सांगता नये । सांगू मी काय
दूरी करुनि अपाय । केले उपाय
बाळपणापासुनि वेडें । तुज सांकडें
सांगू मी कवणापुढें । जालें एवढें
जीवींचें मनींचें पुरविलें । गोमटें केलें
सर्व साहोनियां नेलें । नाहीं पाहिलें
देवा तूं त्रैलोक्यनाथ । मी रे अनाथ
मज करुनि सनाथ । केले समर्थ
दास म्हणे तुझ्या अन्नाचा । वाढलों साचा
मज हा संसार कैचा । सर्व देवाचा
'''भावार्थ--'''
अत्यंत कृपाळू उदार गुणगंभीर अशा श्री रामाला शरण जाऊन संत रामदास म्हणतात की ,जन्माला येण्याचे दुःख वर्णन करून सांगण्यासारखे नाही परंतु श्रीरामाने त्यातील उणिवा काढून उपाय केले आहेत.बाळपणापासून वेड्या मनाने श्रीरामाला अनेक वेळा सांकडे घातले ते इतके झाले आहे की कुणाला सांगता येत नाही.आपल्या जीवनाच्या सर्व मागण्या श्रीरामांनी पूर्ण करून जीवन साजरे बनवले.श्रीराम त्रैलोक्याचे स्वामी असून आपल्यासारख्या अनाथांला नाथ बनून सनाथ केले, समर्थ बनवले. संत रामदास शेवटी म्हणतात श्रीरामाने अन्न देऊन या देहाचे पोषण केले. येथे आपले काही नसून सर्व संसार देवाचा आहे.
'''अभंग --130'''
हे दयाळुवा हे दयाळुवा । हे दयाळुवा स्वामि राघवा
प्रथम का मला लाविली सवे । मग उपेक्षणें योग्य हें नव्हे
सकळ जाणतां अंतर स्थिति । तरी तुम्हांप्रति काय विनंति
दास तुमचा वाट पाहतो बोलतां नये कंठ दाटतो
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास आपले स्वामी राघव अत्यंत दयाळू असून आपल्या अंतःकरणाची स्थिती ते जाणतात.त्यामुळे त्यांना विनंती करून सांगण्याची जरूर नाही पण प्रथम श्रीरामाने दयाळूपणे कोड पुरवून तशी सवय लावली आहे,तेव्हा त्यांनी अशी उपेक्षा करणे योग्य नाही. आतुरतेने वाट बघणाऱ्या या दासाला त्यांनी भेट द्यावी.कंठ दाटून आल्याने अधिक बोलता येत नाही असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--131'''
दीनबंधु रे दीनबंधु रे । दीनबंधु रे राम दयासिंधु रे
भिल्लटीफळें भक्तवत्सलें । सर्व सेवलीं दासप्रमळें
चरणीं उध्दरी दिव्य सुंदरी । शापबंधनें मुक्त जो करी
वेदगर्भ जो शिव चिंतितो । वानरां रिसां गूज सांगतो
राघवीं बिजें रावणानुजे । करुनि पावला निजराज्य जें
पंकजाननें दैत्यभंजने । दास पाळिलें विश्वमोहनें
'''भावार्थ--'''
कमळासारखे मुख असलेला ,राक्षसांचा विनाश करणाय्रा श्रीरामांना दीनबंधू ,दयासिंधु असे संबोधून संत रामदास श्रीरामाची महती सांगत आहेत .शबरीची उष्टी फळे ,दासा वर प्रेम करणाऱ्या भक्तवत्सल श्रीरामाने सेवन केली. आपल्या चरणस्पर्शाने अत्यंत सुंदर अशा अहिल्येचा गौतम ऋषींच्या शापातून मुक्तता करून उद्धार केला.रामचरणांचे
नित्य चिंतन करतात अशा वानरसेनेशी श्रीराम हितगुज करतात.रावणबंधू बिभिषणावर कृपा करून श्री रामाने त्याला आपण जिंकलेले लंकेचे राज्य देऊन उपकृत केले. असे विश्वाला मोहिनी घालणारे श्रीराम, दासांचे पालन करतात असे रामदास म्हणतात.
'''अभंग--132'''
धांव रे रामराया। किती अंत पाहसी
प्राणांत मांडला कीं, । नये करुणा कैसी
पाहीन धणीवरी । चरण झाडीन केशीं
नयन शिणले बा । आतां केधवां येसी
मीपण अहंकारें । अंगी भरला ताठा
विषयकर्दमांत । लाज नाही लोळता
चिळस उपजेना । ऐसे जालें बा आतां
मारुतिस्कंधभागीं । शीघ्र बैसोनी यावें
राघवें वैद्यराजे । कृपाऔषध द्यावें
दयेच्या पद्महस्ता । माझे शिरीं ठेवावें
या भवीं रामदास । थोर पावतो व्यथा
कौतुक पाहतोसी । काय जानकीकांता
दयाळा दीनबंधो । भक्तवत्सला आतां
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास श्रीरामाला दयाळा, दीनबंधो भक्तवत्सला असे संबोधून धाव रे रामराया अशी विनवणी करीत आहेत .मीपणाच्या अहंकाराने मनामध्ये गर्व निर्माण झाला ,देहबुद्धीने विषयाच्या चिखलात लोळत असताना त्याची किळस वाटेनाशी झाली आहे.या संसारात अनेक व्यथा भोगाव्या लागत आहे.प्राणांतांच्या वेदना सहन कराव्या लागताहेत.वाट बघून नयन थकून गेले आहेत. आपली हाक ऐकून करुणाघन राघवानें मारुतीच्या खांद्यावर बसून व त्वरेनें दर्शन द्यावे अशी विनंती करून संत रामदास म्हणतात की त्यांचे दर्शन घेण्यासाठी आपण धरणी वर लोळण घेऊन आपल्या केसांनी राम चरणधूळ झाडू.वैद्यराजे राघवाने दयेचा कमलकर मस्तकावर ठेवून कृपा औषध द्यावे व दासाला भव रोगातून मुक्त करावे.
'''अभंग--133'''
कंठत नाहीं सुटत नाहीं । पराधीनता भारी
शोक सरेना धीर धरेना । अहंममता दु:खकारी
दास म्हणे तो लोभें शिणतो । राघव हा अपहारी
'''भावार्थ--'''
संत रामदास म्हणतात की, दुःखकारी अहंमन्यता व अनावर लोभ याने आपण पराधीन बनलो आहोत .ही पराधीनता सहन करवत नाही ,सरत नाही व धीर धरवत नाही.केवळ दुःखाचे अपहरण करणारा राघवच यांतून सुटका करू शकतो.
'''अभंग--134'''
कल्याण करीं देवराया । जनहित विवरीं
तळमळ तळमळ होत चि आहे । हे जन हातीं धरीं
अपराधी जन चुकतचि गेले । तुझा तूंचि सांवरीं
कठीण त्यावरि कठीण जालें ।आतां न दिसे उरी
कोठें जावें काय करावें । आरंभली बोहरी
दास म्हणे आम्हीं केलें पावलों । दयेसि नाहीं सरी
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास रामरायाला जनहिताचा विचार करून त्यांचे कल्याण करण्यासाठी आळवीत आहेत.सतत चुकत जाणार्या अपराधी लोकांना मदत करण्याची विनंती करीत आहेत. संत रामदास म्हणतात परिस्थिती अधिकाधिक कठीण बनत आहे. कोठे जावे काय करावे हे कळेनासे झाले आहे. जीवाची तळमळ होत आहे.म्हणून मदतीसाठी याचना करीत आहेत.राघवाने अज्ञानी लोकांना सावराव योग्य मार्ग दाखवावा कारण रामाच्या दयेची सर कशालाच येणार नाही.
'''अभंग--135'''
रामा हो जय रामा हो । पतितपावन पूर्णकामा हो
नाथा हो दिनानाथा हो ।तुमचे चरणीं राहो माथा हो
बंधु हो दीन बंधु हो । रामदास म्हणे दयासिंधु हो
'''भावार्थ--'''
श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे पतितपावन आहेत. ते दिनानाथ असून त्यांच्या पायावर आपण माथा ठेवत आहोत. ते दीनबंधू, दया सिंधू आहेत. त्यांचा जयजयकार असो. अशी रामस्तुती संत रामदासांनी या अभंगात केली आहे.
'''अभंग--136'''
जिवींची जीवनकळा सहसा न धरी माइक माळा वो
नादबिंदु कळा त्याहीवरती जिची लीळा वो
तारी दीन जनांला शम विषम दु:खानळा वो
हरी निर्भ्रममंडळा दावी निजात्मसुखसोहळा वो
योग्यांची माउली ऐक्यपणेंविण वेगळी वो
सर्वरुपी संचली पाहतां देहबुध्दि वेगळी वो
नवचे हे वर्णिली परादि वाचा पारुषली वो
अभिन्नभावें भली दासें नयनेविण देखिली वो
'''भावार्थ--'''
परमात्म्याशी एकरूप होण्याची कला शिकलेला भक्त गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घालून भक्तीचे खोटे प्रदर्शन करीत नाही. नाद बिंदु कला लोकांच्या दुःखाचा अग्नी शांतवून दीनांचे रक्षण करते व भक्तांचा भ्रम घालूवून आत्मरुपाचा सुख सोहळा दाखवते. त्याता एकपणा साधता न आल्यास योग्यांची माऊली वेगळी रहाते.योग्यांची माऊली सगळीकडे भरून राहिली आहे असा बोध होताच देहबुध्दी वेगळी होते या अनुभवाचे वर्णन केवळ परावाणीतच करणे शक्य आहे. आत्म भावाने एकरूप झालेल्या रामदासांना रामरूप नयना शिवाय केवळ अंतर्दृष्टीने बघता आले असे रामदास म्हणतात.
'''अभंग--137'''
रे मानवा उगीच आमुची जिणी । आम्हा ध्यानीं भेटीची शिराणी
नरापरिस वानर भले । जिहीं डोळां राम देखियेले
ज्यासी रघुराज। हितगुज बोले । कोण्या भाग्यें भगवंत भेटले
रामीं मिनले ते असो नीच याती । त्यांच्या चरणाची वंदीन माती
नित्य नव्हाळी गाउनि करुं किती । तेणे रघुनाथीं उपजेल प्रीती
रामीरामदास म्हणे ऐका करु । यारे आम्ही तैसाचि भाव धरुं
भक्तिप्रेमाचा दाऊं निर्धारु । तेणें आम्हां भेटेल रघुवीरु
भावार्थ-- संत रामदास या अभंगात म्हणतात की नरापेक्षा वानर चांगले ज्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी रामाचे दर्शन घेतले ज्या वासरांवर श्रीरामाने विश्वास ठेवून त्यांच्याशी हितगुज केल, युद्धाच्या योजना आखल्या.कोणत्या भाग्याने त्यांना भगवंताच्या भेटीचा लाभ झाला असा प्रश्न विचारून संत रामदास म्हणतात परमात्म्याशी भक्तिभावाने एकरूप झालेले वानर निच योनीतले असले तरी आपण त्यांच्या चरणांची धूळ मस्तकी लावून वंदन करू. त्यांची स्तुती पर गीते गात राहू की ज्यामुळे रघुनाथाचे भक्तिप्रेम उपजेल. रामदास शेवटी म्हणतात आपणही त्या वानरासारखा भक्तिभाव धरून भक्तिप्रेमाचा निर्धार करूं की ज्यामुळे आपल्याला श्रीरामाच्या भेटीचा प्रसाद मिळेल.
'''अभंग--138'''
पूर्ण ब्रह्म होय गे । वर्णूं मी आतां काय गे
नंद ज्याचा बाप त्याची । यशोदा ती माय रे
क्षीरसागरवासी गे । लक्ष्मी त्याची दासी गे
अर्जुनाचे घोडे धुतां । लाज नाही त्यासी ग
अनाथाचा नाथ गे । त्याला कैसी जात गे
चोख्यामेळ्यासंगें जेवी । दहीदूध भात गे
नंदाचा जो नंद गे । सर्व सुखाचा कंद गे
रामदास प्रेमें गाय । नित्य त्याचा छंद गे
'''भावार्थ--'''
जो केवळ पूर्णब्रह्म म्हणून ओळखला जातो त्याचे वर्णन शब्दांनी करणे शक्य नाही.नंदराजा त्याचे पिता आणि यशोदा माता आहे तो क्षीरसागरात रहात असून प्रत्यक्ष लक्ष्मीच्या स्वामी असूनही अर्जुनाचा सारथी बनून त्याच्या घोड्यांचा खरारा करतो त्यात त्याला कोणताही कमीपणा वाटत नाही.जातीपातीचा कोणताही भेद भाव न करता तो केवळ अनाथांचा नाथ आहे.तो चोखामेळ्या सारख्या आपल्या आवडत्या भक्ताबरोबर दही दूध भाताचे जेवण करतो. नंदाचा नंदन असून त्याच्या सर्व सुखाचा कंद आहे.संत रामदास म्हणतात आपणास त्याचा नित्य छंद असून त्याचे नाव आपण प्रेमाने गात असतो.
'''अभंग--139'''
वय थोडें ठाकेना तीर्थाटन । बुध्दि थोडी घडेना पारायण
एका भावें भजावा नारायण । पुढें सहजचि सार्थकाचा क्षण
दास म्हणे भजनपंथ सोपा । हळूहळू पावसी पद बापा
कष्ट करुनी कायसा देसि धांपा । रामकृपेनें अनुभव सोपा
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास सांगतात की ,भक्तिभावाने नारायणाचे भजन करावे त्यामुळे जीवनाचे सार्थक करणारा क्षण सहज येतो.भजन पंथ हा आचरणास अगदी सोपा आहे.या मार्गाने गेल्यास यथावकाश मुक्ती सहज प्राप्त होते. असे म्हणतात बालवयात तीर्थयात्रा करणे शक्य नाही बुद्धी अल्प असल्याने धार्मिक ग्रंथांची पारायणे होऊ शकत नाहीत.या गोष्टींसाठी कष्ट करून मन व बुद्धी थकवण्यापेक्षा भजन मार्गाने गेल्यास राम कृपेचा सहजच अनुभव येतो.
'''अभंग--140'''
रामाची करणी । अशी ही
पहा दशगुणें आवरणोदकीं । तारियली धरणी
सुरवर पन्नग निर्मुनियां जग । नांदवी लोक तिन्ही
रात्रीं सुधाकर तारा उगवती । दिवसां तो तरणी
सत्तामात्रें वर्षति जलधर । पीक पिके धरणी
रामदास म्हणे आपण निर्गुण । नांदे ह्रदयभुवनीं
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास श्रीरामाचे महात्म्य वर्णन करीत आहेत. समुद्राने वेढलेली धरणी श्रीरामाने तारली आहे. देव, मानव , पन्नग यांची निर्मिती करून स्वर्ग पृथ्वी पाताळ या तिन्ही लोकांचे पालन करीत आहेत. रात्री चंद्र तारे व दिवसा सूर्य आपल्या तेजाने प्रकट करीत आहेत. श्रीरामाच्या सत्तेने मेघ वर्षाव करतात व धरतीवर पिके पिकतात. संत रामदास म्हणतात असा हा निर्गुण परमात्मा सर्वांच्या ह्रदयांत नांदत आहे.
'''अभंग--141'''
कृपा पाहिजे । राघव कृपा पाहिजे
मन उदासिन इंद्रियदमन । तरिच लाहिजे
निंदक जनीं समाधानी । तरिच राहिजे
दास निरंतर नीच उत्तर । तरिच साहिजे
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास राघवाची कृपा पाहिजे असे म्हणतात.मनातील विषय वासनांचा निरास होऊन मन उदासीन होण्यासाठी, इंद्रियांवर संयम ठेवून त्यांचे दमन करण्याची शक्ती येण्यासाठी,निंदा करणाऱ्या लोकांमध्ये राहून सुद्धा समाधानी वृत्तीने जगण्यासाठी, लोकांनी केलेली निंदा हेटाळणी सहन करण्याची सहनशीलता येण्यासाठी ,रामाची कृपा पाहिजे असे संत रामदास सांगतात.
'''अभंग--142'''
नामचि कारण रे । महाभय नामें निवारण रे
नामें होय चित्त शुध्दि । नामें होय दृढ बुध्दि
नामें महा दोष जाती । पुढें संताची संगति
रामदास सांगे खूण । नाम सिध्दांचें साधन
'''भावार्थ--'''
संत रामदासांनी या अभंगात नामाचा महिमा सांगितला आहे. मृत्युचें महाभय निवारण करण्यासाठी,चित्त शुद्ध होऊन बुद्धी दृढ होण्यासाठी, संतांची संगती मिळवून महा दोषांचे निवारण होण्यासाठी नाम हेच एकमेव साधन आहे संत रामदास सांगतात की,रामनाम हे सिद्धांचे साधन आहे. अखंड रामनामाचा जप ही सिध्दांची खूण आहे.
'''अभंग--143'''
श्रीगुरुंचे चरणकंज हृदयीं स्मरावें
निगमनिखिल साधारण । सुलभाहुनि सुलभ बहू
इतर योग याग विषमपथीं कां शिरावें
नरतनु दृढ नावेसी । बुडवुनी अति मूढपणें
दुष्ट नष्ट सुकर-कुकर तनू कां फिरावें
रामदास विनवि तुज । अझुनि तरी समज उमज
विषयवीष सेवुनियां फुकट कां मरावें
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास गुरु भक्तीचा महिमा सांगताहेत. वेद ,वेदांत ,योग ,याग या कठीण मार्गांचा अवलंब करण्यापेक्षा अत्यंत सहज सोपा असा गुरु वचनावर दृढ विश्वास ठेवून,गुरु चरणांचा आश्रय घ्यावा. संसारसागर तरून जाण्यासाठी नरदेहाची बळकट नौका लाभली असताना मूर्खपणाने तिला विषय वासनेत बुडवून नीच योनींत जाण्याचा धोका पत्करू नये.संत रामदास विनंती करीत आहे की आपण हे समजून घेऊन त्याप्रमाणे वागले पाहिजे.
'''अभंग --144'''
त्रिविध तापहारक हे गुरुपाय ।भवसिंधूसि तारक हे गुरुपाय
स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय । ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय
भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय ।नयनिं श्रीराम दाविती
हे गुरुपाय
सहज शांतीचें आगर हे गुरुपाय ।सकल जीवासी पावन
हे गुरुपाय
'''भावार्थ'''
आध्यात्मिक ,आधिभौतिक, आधिदैविक या त्रिविध तापां पासून सुटका करणारे ,संसार सागरातून तारून नेणारे हे गुरुचरण आहेत.गुरु चरण हे आत्मसुखाचे बीज असून ज्ञानाचे भांडार आहे.साधकांना भक्ती पंथाला लावणारे, डोळ्यांना श्रीरामाचा साक्षात्कार घडवणारें गुरुचरण शांतीचे आगर व कृपेचे सागर आहेत.सकल जीवांना पावन करणारे गुरुचरण रामदासांचे जीवन आहे ,असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--145'''
आतां तरी जाय जाय जाय । धरिं सद्गुरुचे पाय
संकल्प विकल्प सोडूनि राहें । दृढ धरुनियां पाय पाय पाय
नामस्मरण ज्या मुखीं नाहीं । त्याणें वांचुनी काय काय काय
मानवतनु ही नये मागुती । बरें विचारुनि पाहें पाहें पाहें
आत्मानात्म विचार न करितां व्यर्थ प्रसवली माय माय माय
सहस्र अन्याय जरी त्वा केले । कृपा करिल गुरुमाय माय माय
रामदास म्हणे नामस्मरणें । भिक्षा मागुनि खाय खाय खाय
'''भावार्थ--'''
ज्यांच्या मुखात राघवाच्या नामाचा जप नाही त्याचे जीवन व्यर्थ होय.मानव जन्म हा परत परत मिळणार नाही तो दुर्लभ आहे. या जन्मात आत्मा व अनात्मा अविनाशी व विनाशी यांचा विचार केला नाही तर हा जन्म मातेला कष्ट देणारा, व्यर्थ ठरतो. साधकाचे हजार अपराधांना गुरुमाऊली क्षमा करते व त्याच्यावर कृपा करते. नामस्मरण करून भिक्षा मागून खाल्याने सुद्धा जीवनाचे सार्थक होईल असे संत रामदास सांगतात. आत्ताच बोध घेऊन मनातील सर्व भेदाभेद ,संशय ,संकल्प-विकल्प यांचा त्याग करून गुरुंना शरण जावे, त्यांचे पाय धरावे
'''अभंग--146'''
करीं सीताराम मैत्र । होईल देह तुझा पवित्र
वरकड भिंतीवरील चित्र । का भुललासी
कांरे बैसलास निश्चळ । करशिल अनर्थास मूळ
सांडुनी विश्रांतीचे स्थळ कां भुललासी
मुख्य असू द्यावी दया । नाहीतर सर्व हि जाईल वायां
मिठी घाली रामराया । कां भुललासी
करशिल डोळ्याचा अंधार । पाहें जनासी निर्वैर
सांडीं धन संपत्तीचे वारें । कां भुललासी
रामदासाचें जीवन । तू कां न करिसी साधन
राम तोडिल भवबंधन ।कां भुललासी
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास सितारामशी सख्य म्हणजे मैत्री जोडण्यास सांगत आहेत .त्यामुळे साधकाचा देह पवित्र होईल असे ते म्हणतात.बाह्यजगातील कल्पनेच्या चित्रांना भुलून निश्चल बसणे हे अनर्थाचे मूळ आहे.रामचरण हे अंतिम विश्रांतीचे ठिकाण आहे.धन संपत्तीचा मोह सोडून देऊन कुणाशीही वैरभाव न ठेवता दया पूर्ण व्यवहार असावा, नाहीतर या सर्व गोष्टी वाया जातील. श्रीराम हे रामदासांचे जीवन आहे त्यासाठी साधना केल्यास श्रीराम हे संसाराचे बंधन तोडून टाकतील.
'''अभंग--147'''
सुखदायक गायक नेमक साधक तो असावा
हरिभक्त विरक्त संयुक्त विवेकी तो भजावा
'''भावार्थ--'''
सुरेल सुखदायक गायन करणारा गायक , अखंडपणे साधना करणारा साधक, विवेक आणि वैराग्य असलेला हरिभक्त यांचे भजनी लागावे असे संत रामदास या अभंगात सांगतात.
'''अभंग--148'''
प्रपंच दु:खाचा द्रुम । वाढला चुंबित व्योम
तेथें पाहती संभ्रम । सुखाची फळें
सदा फळ आभासे । पाड लागला दिसे
परि तो निष्फळ भासे ।पाहतां देठी
तयावरी दोनी पक्षी ।एक उदास उपेक्षी
येर तो सर्वत्र भक्षी । परि न धाये
सेवितां तयाची छाया । तापली परम काया
तरी ही बैसती निवाया । आत्मरुप प्राणी
रामी रामदासी लक्ष । तोचि जाला कल्पवृक्ष
सेवी सज्जन दक्ष । स्वलाभे पूर्ण
'''भावार्थ--'''
प्रपंच हा दुःखाचा झपाट्याने वाढणारा गगनचुंबी वृक्ष आहे. त्याला सुखाची फळे लागतील हा केवळ भ्रम आह. त्यावर फळे आल्याचा भास निर्माण होतो ती पाडाला लागली आहेत असेही वाटते.परंतु मुळात बघितले तर तो निष्फळ आह. या झाडावर दोन पक्षी वस्ती करून आहेत. एक अत्यंत उदासीन असून पूर्णपणे निरपेक्ष आहे. दुसरा पक्षी कडू-गोड सर्वच फळे सेवन करतो व त्याचे कशानेच समाधान होत नाही. या वृक्षाच्या सावलीचा आश्रय घेणारे दुःखाने होरपळून निघतात. तरीही आत्मरूप प्राणी त्याचा निवारा शोधतात.संत रामदास म्हणतात या वृक्ष संत जणांसाठी तो कल्पवृक्ष होतो व त्यांना त्याचा पूर्ण लाभ मिळतो.
'''अभंग--149'''
ज्ञान पवाड पवाड गगनाहुनी वाड ।
मुक्ति जाड रे जाड रे अत्यंतचि जाड
भक्ति गोड रे गोड रे मुक्तिहुनी गोड।
पुरे कोड रे कोड रे नाही अवघड
दास म्हणे रे म्हणे रे दास्यत्व करावें।
भक्तियोगे रे योगे रे जन उध्दरावे
दया देवाची देवाची सर्वत्रीं पुरावें
वृत्ति संमंधें संमंधें कांहींच नुरावें
'''भावार्थ--'''
अज्ञान हे आकाशासारखे असीम ,अनंत आहे.मुक्ती अतिशय बळकट आहे पण भक्ति ही मुक्तीपेक्षा गोड आहे. अत्यंत सहज साध्य व सर्व अपेक्षा पूर्ण करणारी आहे संत रामदास म्हणतात ,श्री रामाचे दास्यत्व करावे आणि भक्ती भावाने लोकांचा उद्धार करावा.देवाची दया सर्वांना मिळावी कुणीही उपेक्षित राहू नये.
'''अभंग--150'''
नाना पिकाची भोय । वाहिल्याविण जाय
शोधल्याविण उपाय । व्यर्थचि होय
नाना औषधें घेतो । पथ्य न करितो
तैसा वचनें करितो । परि वर्तेना तो
रामदास म्हणे । भीकचि मागणें
आणि वैभव सांगणें । तैसें बोलणें
'''भावार्थ--'''
पीक येण्यासाठी बी पेरले पण त्याची योग्य निगराणी केली नाही तर सर्व काही व्यर्थ जाते. रोग निवारण्यासाठी अनेक औषधे घेतली परंतु पथ्य सांभाळले नाही त्याप्रमाणेच स्वतःच्या वैभवाच्या गोष्टी बोलणारा भीक मागून जगू लागला. संत रामदास म्हणतात प्रत्यक्ष करणे शिवाय बोलणे व्यर्थ आहे. उपाय शोधल्याशिवाय सर्व प्रयत्न वाया जातात.
'''अभंग--151'''
जना जन पाळिताहे
वृध्दा बाळपण बाळा वृध्दपण । अंतर शोधुनि पाहें
श्रेष्ठ कनिष्ठा कनिष्ठ श्रेष्ठां । उसिणें फिटत जाय
जग जगाचें जीवन साचें । कर्ता तो करिताहे
एका पाळितो पाळुनि घेतो । दोंहिकडे फिरताहे
अंतरवासी देव विलासी । दास समजत राहे
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास जगरहाटी बद्दल बोलत आहेत. जीवनात वार्धक्यामुळे शक्तीचा ह्रास होतो व त्यांना बालकासारखे काहीसे परावलंबित्व येते.बालपणातून तारुण्यात कडे जाताना शक्तीची वृद्धी होते व पुढे परत वृद्धपण.अशाप्रकारे श्रेष्ठाला कनिष्ठ पणा व कनिष्ठाला श्रेष्ठपणा प्राप्त होतो.
'''अभंग--152'''
काय पाहों मी आतां । रुप न दिसे पाहतां
खूण न ये सांगतां रे रामा
दृश्य पाहतां डोळा । वाटतो सोहळा
त्याहूनि तू निराळा रे रामा
ज्ञान हातासी आलें । त्याचें विज्ञान जाले
तेंहि नाहीं राहिलें रे रामा
दासें घेतली आळी । पावावें ये काळीं
सगुणरुपें सांभाळीं रे रामा
'''भावार्थ--'''
या दृश्य जगाच्या सोहळा पहाताना वाटते की,राम याहून वेगळा आहे.असे ज्ञान झाल्यानंतर विचारांती ज्ञानाचे विज्ञान झाले पण तेही पंचभौतिक विश्वांत विलीन झाले. संत रामदास म्हणतात आता श्री रामांनी कृपा करावी व आपणांस सगुण रूपात दर्शन द्यावे.
'''अभंग--153'''
चालत नाहीं बोलत नाहीं । हालत नाहीं तो निरंजन
दिसत नाहीं भासत नाहीं । नासत नाहीं तो निरंजन
करीत नाहीं धरीत नाहीं । हरीत नाहीं तो निरंजन
नामचि नाहीं रुपचि नाहीं । चंचळ नाहीं तो निरंजन
निर्मळ जो तो निश्चळ जो तो । दासचि होतो तो निरंजन
'''भावार्थ--'''
या अभंगात संत रामदास निरंजनाच्या स्वरुपाचे वर्णन करीत आहेत.न चालणारा, न बोलणारा ,न हलणारा, डोळ्यांना न दिसणारे असे निरंजनाचे स्वरूप आहे.ज्याला नाम नाही जो निराकार आहे निर्मळ असून तो निश्चळ आहे. जो सर्व काही करीत असूनही अकर्ता आहे. सर्वसत्ताधीश असूनही केवळ साक्षीरूपाने आहे असे सर्वस्वी निरपेक्ष उदासीन वृत्तीने रामरुपाशीं एकरूप झालेले रामाचे दास हे निरंजनाचे स्वरूप आहे.
'''अभंग--154'''
देखिला रे देव देखिला रे । ज्ञानें भक्तिचा रस चाखिला रे
विश्वामध्यें विस्तारला । भावें भक्तांसी पावला
भक्तिलागीं लांचावला । भक्ता पद देतसे
जगामध्यें आहे ईश । म्हणोनि बोलिजे जगदीश
जयाचेनि सुंदर वेश । नाना रुपें शोभती
जनीं श्रोता वक्ता होतो । तोचि देखतो चाखतो
वृत्ती सकळांच्या राखतो। मनीं मन घालुनी
ज्ञानी ज्ञाने विवरला । एक त्रैलोक्यीं पुरला
धन्य धन्य तो एकला । नाना देह चाळवी
सर्व करितो दिसेना । एके ठायी हि वसेना
जवळीच निरसेना । दास म्हणे तो गे तो
'''भावार्थ--'''
संत रामदास म्हणतात आज ज्ञानाने भक्तीचा रस चाखला कारण देव भक्तांच्या भक्तीभावाला पावला व विश्वातील सर्व ठिकाणी स्वरूपानें विलसू लागला. भक्तिप्रेमामुळे वेडा होऊन त्याने स्वपद भक्तांना अर्पण केले.जगात राहणारा ईश म्हणजे जगदीश. या देवानें अनेक रूपे, अनेक वेष धारण केले.जनांमध्ये बसून ऐकणारा श्रोता तोच असतो आणि बोलणारा वक्ता ही त्याचेच रूप.तो अनेक गोष्टी बघतो आणि अनेकविध पदार्थांचा रस चाखतो. सर्वांच्या अंतरंगात प्रवेश करून त्यांच्या वृत्तींशी एकरूप होतो . स्वतःच ज्ञानेश्वर बनून ज्ञानाचे विवरण करतो.एकटा असूनही सर्व देहांना आत्मरूपाने चालवतो.सर्व काही
करीत असूनही एका स्थळी दिसत नाही रामदास म्हणतात तोच तो आज देवरुपाने आपल्याला दिसला.
'''अभंग--155'''
सर्वा अंतरीं आत्माराम । विश्रामधाम
मध्यें आडवा आला भ्रम । देहसंभ्रम
यम नियम दम । नित्य प्राणायाम
आगमनिगम । संतसमागम
ठायी पडेना वर्म । उभे राहिलें कर्म
सदा नित्य नेम । वाची सहस्रनाम
दास म्हणे राम । आहे पूर्ण काम
'''भावार्थ--'''
सर्वांच्या अंतर्यामी असणारा आत्माराम हा सर्व जीवांचे विश्रांतीचे स्थान आहे असे असूनही देहबुद्धी मुळे मनामध्ये संशय विकल्प निर्माण होऊन या विश्वासाला तडा जातो. माणूस यम,नियम प्राणायाम या साधनेच्या मागे लागतो. वेद,पुराणे ,संतवचने यातून वर्म शोधण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा कर्मकांडांचा आश्रय घेतो.अनेक प्रकारच्या उपासना ,उपास-तापास ,व्रते करतो विष्णुसहस्त्रनाम तर कोणी शिवलीलामृताची पारायणे करतो.संत रामदास म्हणतात श्रीराम हे सर्व कामना पूर्ण करणारे आहेत.
'''अभंग --156'''
संसारीं संतोष वाटला । देव भेटला, मोठा आनंदु जाला
सुखसागर उचंबळे । जळ तुंबळे, दु:खसिंधु निमाला
सेवकासी ज्ञान दीधलें । काम साधलें देवदर्शन जालें
आत्मशास्त्रगुरुप्रत्ययें । शुध्द निश्चयें ऐसें प्रत्यया आलें
देवचि सकळ चालवी । देह हालवी, अखंडिताची भेटी
उत्तम सांचला संयोग । नाहीं वियोग, अवघ्या जन्माशेवटीं
दास म्हणे दास्य फळलें । सर्व कळले,ज्ञानें सार्थक जालें
सार्थकचि जन्म जाला । मानवी भला ,परलोकासी नेला
'''भावार्थ--'''
या अभंगात रामदास म्हणतात भक्ताला देव दर्शनाचा लाभ झाला.त्याला ज्ञानाचा लाभ झाला. कामना पूर्ण झाली. गुरू वचनाचा प्रत्यक्ष अनुभव आला. आत्माराम अंतर्यामी राहून हा देह चालवतो असा दृढ निश्चय झाला. जीवा शिवाची अखंड भेट झाली.त्याचा वियोग कधीच संभवत नाही.संत रामदास म्हणतात देव भेटल्यामुळे मनाला संतोष वाटला. दुःख पूर्णपणे विलयास गेले.आनंद सुख सागर उचंबळून आला.आत्तापर्यंतच्या सेवेचे उत्तम फळ मिळाले. आत्मज्ञाना मुळे जन्माचे सार्थक झाल. इहलकी व परलोकी कल्याण झाले.
'''अभंग--157'''
होते वैकंठीचे कोनीं । शिरले अयोध्याभुवनी
लागे कौसल्येचे स्तनीं । तेंचि भूत गे माय
जातां कौशिकराउळीं । अवलोकिली भयंकाळीं
ताटिका ते छळूनि मेली । तेंचि भूत गे माय
मार्गी जातां वनांतरीं । पाय पडला दगडावरी
पाषाणाची जाली नारी । तेंचि भूत गे माय
जनकाचे रंगणीं गेलें । शिवाचें धनु भंगिलें
वैदेही अंगीं संचरलें । तेंचि भूत गे माय
जेणें सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तात्काळचि भ्याला
धनु देऊनि देह रक्षिला । तेंचि भूत गे माय
पितयाचे भाकेसी । कैकयीचें वचनासी
चौदा संवत्सर तापसी । अखंडवनवासी
सांगातीं भुजंग पोसी । तेंचि भूत गे माय
सुग्रीवाचें पालन । वालीचें निर्दालन
तारी पाण्यावरी पाषाण । तेंचि भूत गे माय
रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण
तोडी अमरांचें बंधन । तेंचिभूत गे माय
वामांगीं स्त्रियेसी धरिलें। धावूनि शरयूतीरा आलें
तेथें भरतासी भेटलें । तेंचि भूत गे माय
सर्व भूतांचें हृदय । नांव त्याचें रामराय
रामदास नित्य गाय । तेंचि भूत गे माय
'''भावार्थ--'''
वैकुंठवासी विष्णूंनी त्रेतायुगात श्री रामाचा अवतार घेतला. कौसल्या राणीच्या पोटी राम जन्म झाला. विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेवरून ताटकेचा त्याने वध केला.वनामध्ये मार्गक्रमण करताना गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, तिचा उद्धार केला.जनक राजाच्या नगरीत शिवधनुष्याचा भंग करून जानकीला स्वयंवरात वरले. पराक्रमी परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा वध केला पण श्रीरामाला घाबरून धनुष्य देऊन आपल्या प्राणांचे रक्षण केले. आपला पिता ,राजा दशरथाला कैकयीच्या वचनातून मुक्त करण्यासाठी वनवास पत्करला.14 वर्षे शेषावतार लक्ष्मणाबरोबर वनवास भोगला.सुग्रीवाला न्याय देण्यासाठी वालीचा वध केला. सागरावर पाषाण टाकून सेतू बांधून लंकेत प्रवेश करून,रावण, कुंभकर्णाला मारून देवांना बंधनातून मुक्त केले बिभिषणाचे रक्षण करून लंकेचे राज्य त्याला परत दिले.अयोध्येस परत येऊन भरताला भेटले.रामायणातील या सर्व घटनांचा उल्लेख करून संत रामदास म्हणतात सर्व प्राण्यांचे हृदय त्याचे नाव रामराव. म्हणजेच रामदासांचा स्वामी आत्माराम.
'''अभंग--158'''
आम्ही काय कुणाचें खातो तो राम आम्हांला देतो
बांधिले घुमट किल्ल्याचे तट ।तयाला फुटती पिंपळवट
नाहीं विहीर आणि मोट । बुडाला पाणी कोण पाजीतो
खडक फोडितां सजिव रोडकी । पाहिली सर्वांनीं बेडकी
सिंधु नसतां तियेचें मुखीं । पाणी कोण पाजीतो
नसतां पाण्याचे बुडबुडे । सदासर्वदा गगन कोरडें
दास म्हणे जीवन चहुकडे । घालुनी सडे पीक उगवीती
'''भावार्थ--'''
देवळाचे घुमट, किल्ल्याचे तट येथे पिंपळाचे रोपटे उगवतात.तेथे पाण्याची विहीर मोट नसताना त्यांना पाणी मिळते.खडक फोडताना आत मध्ये जिवंत बेडकी दिसते. तिच्या मुखात पाणी कोण घालतो.आकाशात पाण्याचे बुडबुडे कधी दिसत नाही ते कोरडे असूनही चहूंकडे पाण्याचे सडे घालून पिक उगवतं.संत रामदास म्हणतात ही सगळी रामाची किमया आहे. श्रीराम सर्वांना अन्नपाणी पुरवतो.
'''अभंग--159'''
आम्हा तुम्हा मुळीं जाली नाही तुटी
तुटीविण भेटी इच्छितसां
सर्वकाळ तुम्ही आम्ही एके स्थळीं
वाया म़गजळीं बुडों नये
जवळीच आहे नका धरुं दुरी
बाह्य अभ्यंतरीं असोनियां
लावू नये भेद मायिकसंबंधीं
रामदासीं बोधीं भेटी जाली
'''भावार्थ--'''
संत रामदास म्हणतात देव भक्तांची कधी ताटातूट होत नाही तेव्हां भेट होण्याचा प्रश्नच नाही. सर्वकाळ देव आणि भक्त एकाच ठिकाणी असताना भेटीसाठी तळमळणे म्हणजे मृगजळाच्या पाण्यात बुडण्याची कल्पना करण्यासारखे आहे. भक्ताच्या मनात आणि जनात देवच भरून राहिलेला आहे देवाने आपल्याला दूर करू नये अशी विनंती संत रामदास आपल्या स्वामीला करतात.
'''अभंग--160'''
माझी काया गेली खरें । मी तों आहे सर्वांतरें
ऐका स्वहित उत्तरें । सांग़इन
राहा देहाच्या विसरें । वर्तो नका वाईट बरें
तेणें भक्तिमुक्तिची द्वारें । चोजवती
बुध्दि करावी स्वाधीन । मग हें मजूर आहे मन
हेंचि करावें साधन । दास म्हणे
'''भावार्थ--'''
आपण देहाने जरी हे जग सोडून गेलो तरी सर्वांच्या अंतरात राहून हिताचे बोल सांगत राहीन असा दिलासा संत रामदास आपल्या शिष्यांना देत आहेत. देहबुद्धी सोडून देऊन आत्म बुद्धीने वागावे त्यामुळे भक्ती मुक्तीची दारे उघडतात.बुद्धी जेव्हा स्वाधीन होते तेव्हा मन बुद्धीची चाकरी करू लागते. हे साधन करावे असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग--161'''
सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझें कारणीं देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणें हें चि आतां
'''भावार्थ--'''
हा शेवटचा अभंग म्हणजे संत रामदासांनी केलेली रघुनायका ची प्रार्थना आहे. चारच छोट्या ओळींची ही प्रार्थना मन आकर्षित करते. सदा सर्वदा आपणांस रामाचा योग घडावा ,रामाचा कार्यासाठी हा देह कारणी लागावा, गुणवंत अनंत राधवानें आपली उपेक्षा करू नये हे एकच मागणे ते रघुनायका कडे मागतात.
'''अभंग ---162'''
दृढ होतां अनुसंधान । मन जाहलें उन्मन
पाहों जातां माया नासे ।द्वैत गेलें अनायासें
होतां बोधाचा प्रबोध । जाला शब्दाचा नि:शब्द
ज्ञान विज्ञान जाहलें ।वृत्ति निवृत्ति पाहिलें
ध्यानधारणेची बुध्दि । जाली सहजसमाधि
रामरामदासी वाच्य । पुढें जालें अनिर्वाच्य
'''भावार्थ ---'''
रामचरणाशी मन एकाग्र होतांच मनाचे उन्मन होते म्हणजेमन अधिक उन्नत होते .मी तू पणा विलयास जातो.संसाररुपी माया विरून जाते. मनाला झालेल्या ज्ञानाचे अनुभवात रुपांतर होते पण त्या अनुभवाचे वर्णन करण्यास शब्दच सापडत नाही.ज्ञानाचे विज्ञान होऊन वृत्तिची निवृत्ति होते.ध्यानधारणेची पुढील पायरी म्हणजे सहज समाधी अवस्था प्राप्त होते.संत रामदास म्हणतात कीं, जे बोलून व्यक्त करायचे ते पुढे अनिर्वाच्य होते.रामरुपाशी एकरूप होण्याचा हा अनुभव शब्दांनी व्यक्त करता येत नाही.
'''अभंग--163'''
ज्ञानेविण जे जे कळा । ते तें जाणावी अवकळा
ऐसें भगवंत बोलिला ।चित्त द्यावें त्याच्या बोला
एक ज्ञानची सार्थक । सर्व कर्म निरर्थक
दास म्हणे ज्ञानेविण ।प्राणी जन्मला पाषाण
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास ज्ञानाची महती सांगत आहेत.ज्ञानाशिवाय जे जे प्रयत्न ते सर्व विफल होत,असे प्रत्यक्षभगवंतांनी सांगितले आहे आणि हे बोल चित्तात धारण केलेपाहिजे.ज्ञानामुळे सर्व कर्माचे सार्थक होते, त्या शिवाय सर्वनिरर्थक होय.संत रामदास म्हणतात ज्ञानविहीन प्राणी म्हणजे केवळ पाषाण होय.
'''अभंग ---164'''
पतित म्हणिजे वेगळा पडिला ।
पावन तो जाला एकरुप
एकरूप देव अरूप ठायींचा ।
तेथें दुजा कैंचा कोण आहे
कोण आहे दुजा स्वरूपीं पाहतां ।
विचारें राहतां सुख आहे
सुख आहे मूळ आपुलें शोधितां।
मनासी बोधितां रामदास
'''भावार्थ---'''
रामापासून जो अलग झाला तो पतित व परमात्याशी जो एकरूप झाला तो पावन झाला.म्हणुनच परमात्म्याला पतितपावन म्हणतात.देव आणि भक्त जेव्हां एकरूप होताततेव्हां तेथे दुजेपणाचा लोप होतो.देव हे भक्ताचे मूळ स्वरूपआहे या विचारांत सतत रममाण होऊन राहणे यातच खरे सख आहे.आपण कोठून आलो व आपल्या जीवनाचे प्रयोजनकाय याचा बोध करुन घेण्यातच आपल्या जीवनाचे सार्थक
आहे असे संत रामदास स्वप्रचिती घेऊन सांगत आहेत.
'''अभंग---165'''
ज्याचेनि जितोसी त्यासी चुकलासी ।
व्यर्थ कां जालासी भूमिभार
भूमिभार जिणें तुझें गुरूविणे।
वचनें प्रमाणें जाण बापा
जाण बापा गुरूविण गति नाहीं ।
पडसी प्रवाहीं मायाजाळीं
मायाजाळी व्यर्थ गुंतलासी मूढा ।
जन्मभरी ओढा ताडातोडी
कांही ताडातोडी काही राम जोडी।
आयुष्याची घडी ऐसी वेंचीं
ऐंसी वेंचीं बापा आपुली वयसा ।
दास म्हणे ऐसा काळ घाली
'''भावार्थ----'''
संत रामदास या अभंगात सद्गुरूचा महिमा वर्णन करीतआहेत.ज्याच्यामुळे हा जीवन प्रवाह सुरळीत चालला आहे त्याचेच स्मरण करायला विसरणे म्हणजे जीवन व्यर्थ घालवणे होय.भूमिभार होऊन जगणे आहे.गुरूकृपेशिवायजीवन निरर्थक आहे हे वचन प्रमाणभूत आहे.सद्गुरूशिवायजीवनाला गती नाही कारण संसाराच्या मायारूपी बंधनापासून सुटण्याचा गुरूकृपा हाच एक मार्ग आहे.याचाविचार न करता आपण अविचाराने या मायाजाळांत गुंतून पडतो आणि सगळा जन्म ओढाताणित व्यर्थ घालवतो.कांहीकाळ संसारातिल कर्तव्य व कांही वेळ रामभजनी लावावाव मानव जन्माचे सार्थक करावें असे संत रामदास सांगतात.
'''अभंग ---166'''
विषयीं विरक्तपण इंद्रियेनिग्रहण
गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे
चंचळपणें मन न करी विषयध्यान ।
गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे
बुध्दि बोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण ।
गरुकृपे वांचुनि नव्हे नव्हे
भक्तिज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण ।
गुरूकृपे वांचुनि नव्हे नव्हे
रामीरामदास म्हणे निर्गुणसुख लाधणे।
गुरूकृपे वाचुनि नव्हे नव्हे
'''भावार्थ ----'''
इंद्रियांवर निग्रहाने संयम मिळवून त्यांना विषयांपासून विरक्त करणे,मनाचा चंचलपणावर मात करून त्याला विषयाचे ध्यान करण्यापासून परावृत्त करणे,बुध्दी परमात्मस्वरुपाचा बोध करवणारी असून तिच्या सहाय्याने परब्रह्माचा अनुभव घेणे,सप्रेम भक्ति,ज्ञान,वैराग्य या सर्वांचा पारमार्थिक लाभ होण्यासाठी सद्गुरूंच्या कृपाप्रसादाचीनितांत गरज असते.संत रामदास म्हणतात सत्व,रज,तम या त्रिगुणांच्या पलिकडे जाऊन निर्गुणसुख लाभणे केवळ गुरूकृपेनेच शक्य होईल.
'''अभंग---167'''
सगुण हा देव धरावा निश्चित ।
तरी नाशवंत विश्व बोले
विश्व बोले एका भजावें निर्गुण ।
परी लक्षवेना काय कीजे
काय किजे आतां निर्गुण दिसेना ।
सगुण असेना सर्वकाळ
सर्वकाळ गेला संदेहीं पडतां ।
कोणे वेळे आतां मोक्ष लाभे
मोक्ष लाभे एका सद्गुरूवचनें ।
आत्मनिवेदनें रामदासीं
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास साधकाच्या मनातिल संदेह वत्यावरील उपाय सांगत आहेत. सगुणाची उपासना करावी असा निश्चय साधक मनोमन करतो परंतू परमेश्वराचे सगुणरूप नाशवंत असून त्याची उपासना करण्यापेक्षा निर्गुणाचीउपासना करावी,त्याचे भजन करावे असे मत लोक बोलून दाखवतात त्या मुळे साधक द्विधा मनस्थितीत सापडतो.निर्गुणाचे भजन करावे तर ते रूप डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत
नाही आणि सगुणरूपही सदासर्वकाळ दिसत नाही तरकाय करावे या संभ्रमात सर्वकाळ निघून जातो आणि आतां केव्हां मोक्ष मिळेल अशी विवंचना मनाला ग्रासून टाकते.संतरामदास म्हणतात एका सद्गुरूवचनावर पूर्ण विश्वास ठेवून,संपूर्ण शरणागती पत्करून आत्मनिवेदन भक्तीने परमेश्वरचरणी लीन होऊन मोक्ष मिळवावा.
'''अभंग ---168'''
गरुविण प्राणी त्या होय जाचणी ।
सत्य माझी वाणी मिथ्या नव्हे
मिथ्या नव्हे सत्य सांगतो तुम्हाला
अंती यमघाला चुकेना की
चुकेना की यमयातना या जना ।
वेगीं निरंजना ठाईं पाडा
ठाई पाडा वेगीं निरंजन ।
लावा तनमन सद्गुरूसी
सद्गुरूची नाहीं जयाला ओळखी
तया झोंकाझोंकी यातनेची
यातनेची चिंता चुके एकसरी ।
वेगीं गुरू करी दास म्हणे
'''भावार्थ---'''
संत रामदास या अभंगात प्रतिज्ञेवर सांगतात की, गुरूशिवाय कोणत्याही माणसाला यमयातना चुकवता येणार नाहीत.निरंजन परमेश्वराची प्राप्ती सद्गरूशिवाय शक्य नाही . यासाठी तनमनधनाने सद्गुरूची उपासना केली पाहिजे.सद्गुरूकृपेने यमयातनेची चिंता तात्काळ निरसून जाईल यासाठी संत रामदास लवकरात लवकर
गुरूचरणांचा आश्रय घेण्यास सांगत आहेत।
'''अभंग---169'''
आमुचा तो देव एक गुरूराव ।
द्वैताचा तो ठाव नाहीं जेथें
गुरूने व्यापिले स्थिर आणि चर ।
पहा निर्विकार कोंदलासे
रामीरामदास उभा तये ठाई।
माझी रामाबाई निर्विकार
'''भावार्थ----'''
या अभंगात संत रामदास आपले सद्गुरू श्री रामाचा महिमासांगत आहेत.आपले सद्गुरू श्रीराम हे एकमेव अद्वितियअसून तेथे द्वैताला जागाच नाही.त्यांनी सर्व चराचर व्यापले असून त्यांत ते निर्विकारपणे सामावले आहेत.संत रामदासम्हणतात आपण श्रीरामांच्या निराकार स्वरूपाशी एकरूपझाले आहोत.
'''अभंग---170'''
श्रीगुरूकृपाज्योती ।नयनीं प्रकाशली अवचिती
तेथे कापूस नाही वाती । तैलविण राहिली ज्योती
नाहीं सम ई दिवे लावणे । अग्निविण दीप जाणे
रामीरामदास म्हणे । अनुभवाची हे खूण
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात, श्रीकृपेची ज्योती माझ्या लोचनांत अचानक प्रकाशित झाली.कापूस,वाती आणि तेलाशिवायतेवणारी ही असामान्य ज्योती आहे.दिवा व अग्नीशिवाय प्रकाश देणारी ही कृपेची ज्योत म्हणजे दैवी अनुभवाची खूण आहे.
'''अभंग---171'''
त्रिभुवनासी क्षयरोग । एक सद्गुरू आरोग्य
जे जे तया शरण गले ।ते ते आरोग्य होऊनि ठेले
शरण रामी रामदास ।क्षयातीत केलें त्यास
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात स्वर्ग,पृथ्वी,नरक या तिनही भुवनांना क्षयरोगाची बाधा आहे.हे सर्व विश्व नाशवंत आहे.केवळ आपले सद्गुरू हे परमेश्वरी तत्व अविनाशी आहे.जे जे या अविनाशी तत्वाला शरण गेले त्या परमेश्वरी तत्वाशी एकरूप झालें तेच केवळ शाश्वत झाले.राम चरणाशी शरण जाऊन रामदास क्षयातीत झाले.
'''अभंग---172'''
ब्रम्हांडचि तीर्थ जालें ।जयाचेनी एका बोलें ।।
सद्गुरूची पायवणी ।सकळ तीर्था मुकुटमणी ।।
रामीरामदास म्हणे । महिमा धाता तोही नेणें ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,ज्याच्या केवळ एका वचनाने सर्व ब्रम्हांडाचे तीर्थक्षेत्र बनले त्या आपल्या सद्गुरूचा चरणस्पर्श सकळ तीर्थाचा मुकुटमणी आहे.जो साधक त्यांचा महिमा जाणून घेईल त्यालाच हे समजून येईल.
'''अभंग---173'''
एक हेंअनेक, अनेक जें एक । अनुभवीं देख स्वानुभव ।।
कोठुनिया जालें कैसे आकारलें । वेदी वर्णियेलें ज्ञानकांडी ।।
तें गुज सद्गुरूकृपे कळों आलें । दास म्हणे जालें ब्रह्मरूप ।।
'''भावार्थ---'''
हे अनेकरुपी विश्व एकाच चैतन्य तत्वातून साकारले आहे.विश्वाचे हे अनेकत्व एकाच परमात्म्याचे प्रतिबिंब आहे.ही आत्मप्रचितिची ,स्वानुभवाची गोष्ट आहे.हे आत्मतत्व कोठून व कसे आकारास आले याचे वर्णन वेदांच्या ज्ञानकांडात केलेले आहे संत रामदास म्हणतात, हे रहस्य सद्गुरूकृपेमुळे समजून येते.
'''अभंग---174'''
एक तो गुरू दुसरा एक सद्गुरू
सद्गुरूकृपेवाचुनि न कळे ज्ञानविचारू
पारखी नेणती ज्ञानी ओळखती ।
गुरू केला परि ते नाहीं आत्मप्रचिति
म्हणोनि वेगळा सद्गुरू निराळा ।
लक्षांमध्यें कोणी एक साधु विरळा
सद्य प्रचीति नसतां विपत्ति ।
रामदास म्हणे कैसी होईल रे गति
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,गुरू अनेक प्रकारचे असतात पण सद्गुरू एखादाच असतो.सद्गुरूवाचुन ज्ञानविचार समजत नाही.ज्या प्रमाणे खरा रत्नपारखीच रत्नाची खरी पारख करू शकतो त्या प्रमाणे गुरू केला म्हणजे आत्मप्रचिति येत नाही.लक्ष साधुंमध्ये एखादाच सद्गुरू असतो जो आत्मप्रचिति देऊ शकतो.आत्मप्रचिति नसलेला साधक संकटांत सापडतो.त्याला सद्गती म्हणजे मोक्षलाभ होऊ शकत नाही.
'''अभंग---175'''
सद्गुरू लवकर नेती पार ।।
थोर भयंकर दुस्तर जो अति। हा भवसिंधु पार ।।
षड्वैय्रादिक क्रुर महामीन । त्रासक हे अनिवार ।।
घाबरला मनिं तीव्र मुमुक्षु । प्रार्थित वारंवार ।।
अनन्यशरण दास दयाघन । दीनजनां आधार ।।
'''भावार्थ---'''
हा संसार सागर पार करून जाण्यास अत्यंत कठिण आहे.या भव सागरांत मद,मोह,लोभ,मत्सर या सारखे अत्यंत दुष्ट असे भयानक मासे आहेत,ते अनिवार त्रास देणारे आहेत.त्या षड्ररिपुंना मोक्षाची ईच्छा करणारा साधक अतिशय घाबरून सद्गुरूंची वारंवार प्रार्थना करु लागतो.अशा वेळीं सद्गुरू साधकाला मदत करून भवसिंधुपार नेतात.अनन्यशरण अशा दासाला दीनजनांचा आधार असलेले करुणामय सद्गुरूच वाट दाखवतात.
'''अभंग---176'''
तुजविण गुरूराज कोण प्रतीपाळी ।
मायबाप कामा न ये कोणी अंतकाळीं
जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं ।
तुजविण मज वाटे तसें धांव लवलाही
चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा ।
पाडसासी हरिणी जसी तेंवि तूं कृपाळा
रामदास धरूनी आस पाहे वास दिवसरात ।
खास करिल काळ ग्रास, ध्यास हा मानसी
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास सद्गुरूचा धावा करीत आहेत.ते म्हणतात,अंतकाळीं जन्मदाते मायबाप कामास येत नाहीत.त्या वेळी सद्गुरू सारखा कोणी सांभाळ करणारा नाही.कोरड्या डोहांत पडलेला मासा जसा पाण्याविणा तळमळतो तशी आपली अवस्था झाली आहे.चकोर पक्षी जशी चंद्रोदयाची,गाय वासराची,आई लेकराची,हरिणी पाडसाची आतुरतेने वाट पहाते त्या प्रमाणे संत रामदास आपल्या कृपाळु सद्गुरूची आळवणी करीत आहेत.काळाचा ग्रास होण्यापूर्वी श्री रामाने आपणास दर्शन द्यावे असा धावा ते करीत आहेत.
'''अभंग---177'''
गुरूवरें दातारें । अभिनव कैसें केलें
.एकचि वचन न बोलत बोलुनि । मानस विलया नेलें
भूतसंगकृत नश्वर ओझें । निजबोधें उतरिलें
दास म्हणे मज मीपणाविरहित । निजपदीं नांदविलें
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,आपल्या सद्गुरूंनी अभिनव करणी केली.एकही शब्द न बोलतां त्यांनी केवळ दर्शनाने या चंचल मनाचे हरण करुन ते विलयास नेल,पंचमहाभूतांचा हा नाशवंत पसारा निजबोधाने क्षणांत नाहिसा झाला.मीपणाच्या अहंकाराचे ओझे उतरवून चरण कमलांशी शाश्वत स्थान प्रदान केलें.
'''अभंग---178'''
अपराधी आहे मोठा। मारणें कृपेचा सोटा
गुरुराज सुखाचे कंद । नेणुनि केला हा निजछंद ।
तेणें पावलों मी बंध । जालों निंद्य सर्वस्वीं
तारीं तारीं सद्गुरुराया । वारीं माझे तापत्रया ।
तुझे पाय काशी गया । आहे मजला सर्वस्वीं
आतां अंत पाहसी काय । तूंचि माझा बापमाय ।
रामदास तुझे पाय । वारंवार वंदितो
'''भावार्थ---'''
सद्गुरू हे आनंदाचे कंद असून त्यांचा आपल्याला छंद लागला आहे,त्यांच्या चरणाशी बांधला गेल्यामुळे आपण पुर्णपणे निंद्य बनलो आहे.सद्गुरूंचे पाय काशी गयेसारखे तीर्थस्थाने असल्याने आपली आधिभौतिक,आधिदैविक,आध्यात्मिक या तिनही तापांपासून सुटका करावी अशी विनवणी करून संत रामदास परत परत सद्गुरू चरणांना वंदन करतात.
'''अभंग---179'''
त्रिविध तापहारक हे गुरूपाय।
भवसिंधूसी तारक हे गुरुपाय
स्वात्मसुखाचें बीज हे गुरुपाय।
ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय
भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय।
नयनीं श्रीराम दाविती हे गुरुपाय
सहज शांतीचे आगर हे गुरुपाय।
पूर्णकृपेचे सागर हे गुरुपाय ।
सकळ जीवांसी पावन हे गरुपाय
'''भावार्थ---'''
तिनही तापांचे हरण करणारे,संसारसागर तारून नेणारे,आत्मसुख देणारे,ज्ञानाचे रहस्य उलगडून दाखवणारे,भक्तिपंथास लावून श्रीरामाचे दर्शन घडवणारे सद्गुरूचे हे चरणकमल शांतीचे आगर असून पूर्णकृपेचे सागर आहेत.हे गुरुपद सर्व जीवांना पावन करणारे आहेत असे संतरामदास या अभंगात सांगतात.
'''अभंग---180'''
शरण जावें संतजनां। सत्य मानावें निर्गुणा
नाना मतीं काय चाड । करणें सत्याचा निवाड
ज्ञाने भक्तीस जाणावें । भक्त तयास म्हणावें
रामीरामदास सांगे । सर्वकाळ संतसंग
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास संत-सज्जनांची महती सांगत आहेत.सगुण व निर्गुणाची उपासना या विषयीं अनेक मत-मतांतरे आहेत, यातून सत्य काय आहे हे समजून घ्यावे निर्गुण हेंच अंतिम सत्य मानावे. या ज्ञानातूनच भक्तीचा उगम होऊन साधक प्रेमळ भक्त बनतो.यासाठी संत-सज्जनांना शरण जावे,सदा सर्वकाळ संतांच्या संगतीत राहावें.
'''अभंग---181'''
संसार करावा सुखें यथासांग ।
परी संतसंग मनीं धरा
मनीं धरा संतसंगतिविचार ।
येणें पैलपार पाविजेतो
पाविजेतो याची प्रचीत पहावी ।
निरूपणी व्हावी अतिप्रीती
अतिप्रीती तुम्ही निरूपणी धरा।
संसारी उध्दरा असोनिया
असोनियां नाहीं माया सर्वकांहीं ।
विवंचूनि पाहीं दास म्हणे।
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,साधकाने प्रपंच सुखाने यथासांग करावा पण मनाने मात्र संतसंगतीची आस धरावी.या संसार सागरातून तरून जाण्याचा संतसंग हा एकच मार्ग आहे,याच अनुभव घ्यावा.परमेश्वराच्या रम्य कथांच्या निरूपणांचा अतिप्रीतीने अस्वाद घ्यावा आणि संसारांत राहून स्वता:चा उध्दार करून घ्यावा.माया असूनही सर्वकाही नाही ही क्षणभंगूरता विचाराने समजून घ्यावी.
'''अभंग---182'''
ज्या जैसी संगति त्या तैसीच गति ।
समागमें रीति सर्वकांहीं
सर्वकांहीं घडे संगती गुणें ।
साधूचीं लक्षणें साधुसंगे
साधुसंगें साधु होइजे आपण।
रामदास खूण सांगतसे
'''भावार्थ---'''
ज्याची संगत जशी असेल त्या प्रमाणेच तो वागत असतो,त्या प्रमाणेच त्याची कर्म गती ठरते.सर्वकांही जे चांगले,वाईट घडते ते संगतीच्या गुणांमुळेच घडत असते.साधूंच्या संगतीने साधक साधू बनतो असे संत रामदास स्वप्रचितीने सांगतात.
'''अभंग---183'''
दुर्जनाचा संग होय मना भंग ।
सज्जनाचा योग सुखकारी
सुखकारी संग संतसज्जनाचा ।
संताप मनाचा दुरी ठाके
दुरी ठाके दु:ख सर्व होय सुख ।
पाहों जातां शोक आढळेना
आढळेना लोभ तेथें कैंचा क्षोभ ।
अलभ्याचा लाभ संतसंगें
संतसंगें सुख रामीरामदासी ।
देहसंबंधासी उरी नाही
'''भावार्थ---'''
दुर्जनांचा संग मनोभंग करणारा असतो तर सज्जनांचा सहवास सुखकारी आहे कारण त्या मुळे मनाचा संताप नाहिसा होतो,दु:ख दूर होते,शोक नाहीसा होतो.संत सहवासात मन लोभातीत होते आणि निर्लोभी मन क्षोभापासून मुक्त होते.संताप ,दु:ख, लोभ व क्षोभ नाहिसे करून निरामय शांती सुखाचा अलभ्य लाभ संतसंगामुळे घडून येतो.त्या मुळे देहबुध्दी विलयास जावून आत्मसुखाचा लाभ होतो असे श्रीरामी मन गुंतलेले संत रामदास आत्मप्रचीतीने सांगत आहेत.
'''अभंग---184'''
प्रवृत्ति सासुर निवृति माहेर ।
तेथे निरंतर मन माझें
माझे मनीं सदा माहेर तुटेना ।
सासुर सुटेना काय करूं
काय करूं मज लागला लौकिक ।
तेणें हा विवेक दुरी जाय
दुरी जाय हित मजचि देखतां ।
प्रेत्न करूं जातां होत नाहीं
होत नाहीं प्रेत्न संतसंगेंविण ।
रामदास खूण सांगतसें
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,साधकाच्या जिवनांत सासर हे प्रवृत्तिसारखे असून माहेर हे निवृत्ति प्रमाणे आहे.नववधूला माहेरची ओढ अनिवार असते कारण तेथें संसारातिल दु:ख काळजी ,चिंता या पासून मुक्तता असते तर सासर हें प्रवृत्तिसारखे आहे,सासरच्या जबाबदार्यां पासून सुटका नाही.संसारांत राहून सतत लौकिकाचा विचार करावा लागतो त्यामुळे निवृत्तिचा विवेक दूर जातो,जसे स्त्री ला माहेर पारखे होते ,प्रयत्न करुनही विवेकाचा मार्ग सापडत नाही हा विवेकाचा मार्ग केवळ संताच्या संगतिनेच सापडू शकेल असे संत रामदास अनुभवाने सांगतात,
'''अभंग---186'''
जाणावा तो साधु जया पूर्ण बोधु ।
भूतांचा विरोधु जेथ नाहीं
कल्पनेचा देहो त्या नाहीं संदेहो ।
सदा नि:संदेह देहातीत।
जया नाहीं क्रोध जया नाहीं खेद ।
जया नाही बोध कांचनाचा
रामदास म्हणे साधूचीं लक्षणें
अति सुलक्षणें अभ्यासावीं
'''भावार्थ---'''
पूर्ण बोध असलेला साधू कसा ओळखावा याची लक्षणे संत रामदास या अभंगात सांगत आहेत, सर्व प्राणिमात्रांबद्दल प्रेमभाव असणें, कोणताही वैरभाव नसणे हे साधूचे प्रथम लक्षण आहे.तो पूर्णपणें नि:संदेह , संशयातित असतो तसेच त्याची देहबुध्दी संपूर्ण नाहीशी झालेली असते,खेद आणि राग या पासून मुक्त असून कांचनाचा (पैशाचा) अजिबात मोह नसतो. या सुलक्षणावरुन खरा साधू आओळखावा.
'''अभंग---187'''
आमुचे सज्जन संत साधुजन ।
होय समाधान तयांचेनि
तयांचेनि संगे पाविजे विश्रांति ।
साधु आदिअंतीं सारखेचि
सारखेचि सदा संत समाधानी ।
म्हणोनियां मनीं आवडती
आवडती सदा संत जिवलग ।
सुखरूप सदा संग सज्जनांचा
सज्जनांचा संग पापातें संहारी ।
म्हणोनियां धरी रामदास
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास म्हणतात, आपले संत हे सज्जन असे साधुजन आहेत, त्यांच्या सहवासाने मनाचे समाधान होते, मनाला शांतता लाभते.संत सदासर्वकाळ सारखेच समाधानी असतात त्यां मुळे ते जिवलग मित्रा प्रमाणे आवडतात,त्यांचा सहवास सुखदायी असतो.संताचा सहवास पापनाशक असतो म्हणून आपल्याला तो आवडतो असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग---188'''
देव आम्हांसी जोडला संतसंगें सापडला
कडाकपाटीं शिखरीं ।धुंडिताती नानापरी
नाना शास्त्रें धांडोळती । जयाकारणें कष्टती
रामदास म्हणे भावें । वेगीं संता शरण जावें
'''भावार्थ---'''
साधक परमेश्वर प्राप्तीसाठी पर्वतांची शिखरे, कडेकपारी धुंडाळतात,नाना शास्त्रांचा अभ्यास करतात त्या साठी खूप कष्ट करतात. संत रामदास सांगतात,आपल्याला संतसंगती मुळेच परमेश्वर प्राप्ती झाली.पूर्ण भक्तिभावाने संतांना शरण जाणे हाच परमेश्वर प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे ,
'''अभंग---189'''
ब्रह्मादिकांसी दुर्लभ । देव भक्तांसी सुलभ
थोरपणे आढळेना ।जाणपणासी कळेना
नाहीं योगाची आटणी । नाहीं तप तीर्थाटणी
दास म्हणे साधूविण ।नानासाधनांचा शीण
'''भावार्थ---'''
ब्रह्मा, विष्णु,महेश या देवांना मिळण्यास कठिण असलेला परमात्मा साध्याभोळ्या प्रेमळ भक्तांना मात्र सुलभ असतो कारण मोठेपणाचा अहंकार व ज्ञानाचा गर्व नसतो.भक्तांना योग,याग ,यज्ञ ,तप तीर्थयात्रा यांपैकी कोणतेही साधन आवश्यक वाटत नाही. संत रामदास म्हणतात,संत सज्जनांच्या कृपेशिवाय हा सर्व साधनांचा आटापिटा व्यर्थ आहे.
'''अभंग---190'''
संतांचेनि संगे देव पाठीं लागे ।
सांडूं जातां मागें सांडवेना
सांडवेना देव सदा समगामी ।
बाह्य अंतर्यामीं सारिखाचि
सारिखाचि कडाकपाटीं खिंडारीं ।
गृहीं वनांतरीं सारिखाचि
सारिखाचि तीर्थ सारिखाचि क्षेत्री ।
दिवा आणि रात्रीं सारिखाचि
सारिखाचि अंत नाहीं तो अनंत ।
रामदासीं किंत मावळला
'''भावार्थ---'''
संतांच्या संगतित असतांना देव सतत भक्तांचा पाठिराखा असतो,त्याला पाठिमागे सोडून जाऊ म्हटले तरी सोडवत नाही. देव सतत बाहेर व अंतरंगात सामावलेला असतो.पर्वताच्या शिखरावर, कडे व कपारिमध्ये ,वनांत व घरांत तो नेहमीच सोबतिला असतो.दिवस रात्री, तीर्थक्षेत्रीं हा परमेश्वर संतांच्या संगतीत असलेल्या भक्तांची साथ सोडत नाहीं.
'''अभंग---191'''
संत सज्जनांचा मेळा ।त्यासि लोटांगण घाला
तेथें जाऊनि उभे राहा ।रामदास नयनीं पहा
गुण श्रीरामाचे गाती । कथा रामाची ऐकती
तेथे रामही असतो ।कथा भक्तांची ऐकतो
जेथें राम तेथें दास ।सदृढ धरावा विश्वास
'''भावार्थ---'''
जेथे संत सज्जनांचा समुदाय असेल तेथें जाऊन उभे राहावें श्रीरामाचे गुण गाणाय्रा,रामकथा आवडीने ऐकणाय्रा त्या रामदासांना डोळ्यांनी प्रत्यक्ष बघावें आणि त्यांना लोटांगण घालावें कारण तेथें स्वता: श्रीराम भक्तांच्या कथा ऐकण्यासाठीं आलेला असतो. जेथें राम तेथें दास असणारचया विषयीं दृढ विश्वास असावा.
'''अभंग---192'''
तुम्ही चिंता हो मानसीं । राम शरयूतीर निवासी
रूप सांवळें सुंदर । ज्याला ध्यातसे शंकर
जडित जडित कुंडलें श्रवणीं । राम लावण्याची खाणी
सूर्यवंशाचें मंडण । राम दासाचें जीवन
'''भावार्थ---'''
शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या अयोध्या नगरींत निवास करणाय्रा, सावळ्या सुंदर रामरूपाचे मनामध्यें ध्यान करावें कानामध्ये रत्नजडित कुंडले असलेला श्रीराम लावण्याची खाण असून सूर्यवंशाचे भुषण आहे.संत रामदास म्हणतात,श्रीराम रामदासांचे जीवन आहेत.
'''अभंग---193'''
शोभे ठकाराचें ठाण । एकवचनी एकबाण
बाप विसांवा भक्तांचा । स्वामी शोभे हनुमंताचा
मूर्ति शोभे सिंहासनीं ।तो हा राजीव नयनी
सूर्यवंशाचें मंडण ।राम दासाचें भूषण
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणातात,आपल्या स्वामींचे स्थान अत्यंत शोभायमान आहे.तेथें कमला सारखे लोचन असलेल्या श्रीरामांची सुंदर मूर्ती शोभून दिसत आहे जो हनुमंताचा स्वामी आहे.सूर्यवंशाचे भूषण असलेला हा श्रीराम एकवचनी एकबाणी असून भक्तांचा विसावा व रामदासांचे भूषण आहे.
'''अभंग---194'''
तो हा राम आठवावा । ह़दयांत सांठवावा
रामचरणीची गंगा । महापातके जातीं भंगा
रामचरणीची ख्याति । चिरंजीव हा मारुती
चरण वंदी ज्याचे शिरी । बिभीषण राज्य करी
शबरीची बोरें खाय । मोक्ष दिला सांगूं काय
रामदास म्हणे भावें ।कथा कीर्तन करावें
'''भावार्थ---'''
श्री रामाचे सतत स्मरण करावे ,रामाचे रूप व गुण अंतरात साठवावे .रामचरणाचे तीर्थ गंगोदका प्रमाणे पवित्र असून महापातकांचा नाश करणारें आहे.रामचरणांचा दास मारुती चिरंजीव झाला अशी त्याची किर्ति आहे.रामचरणांना वंदन करणारा बिभीषण लंकेचा राजा बनला.शबरीची बोरे चाखून श्री रामाने तिला मोक्षाची अधिकारी बनवलें अशा कृपाळू रामाच्या कथांचे कीर्तन करावें असे या अभंगात संत रामदास सांगतात.
'''अभंग---195'''
ऐसा नव्हे माझा राम । सकळ जीवांचा विश्राम
नव्हे गणेश गणपाळु । लाडु मोदकांचा काळू
नव्हे चंडी मुंडी शक्ति । मद्यमांसाते मागती
नव्हे भैरव खंडेराव । रोटी भरितांसाठीं देव
नव्हे जोखाई जोखाई । पीडिताती ठाईं ठाईं
नव्हे भूत नव्हे खेत ।निंब नारळ मागत
रामदासी पूर्णकाम । सर्वांभूती सर्वोत्तम
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास आपले सद्गुरू कसे नाहीत हें सांगत आहेत.श्रीराम हे गणांधिपती गणेशा सारखे लाडु, मोदक खाणारे नाहीत किंवा चंडी,मुंडी या शक्तिदेवतां प्रमाणें मद्यमांसाचा नैवेद्य मागणारे नाही.श्रीराम भैरव खंडेराया सारखे भरित रोटी घेऊन प्रसन्न होणारे नाहीत ,जोखाई सारखे रागावून पीडा देणारे नाहीत तसेच भूताखेतांची बाधा टळावी म्हणुन लिंबू,नारळ मागत नाहीत.सद्गुरू श्रीराम सर्व प्राणिमांत्रांच्या सगळ्या कामना पुर्ण करणारे-असून सर्व जीवांना विश्राम देणारे सर्वोत्तम देवाधिदेव आहेत.
'''अभंग---196'''
सोडवि जो देव तोचि देवराव।
येर जाण नांव नाथिलेंचि
नाथिलेंचि नांव लोकांमध्यें पाहे ।
ठेविजेत आहे प्रतापाचें
प्रतापाचें नांव एका राघवासी ।
रामीरामदासी देवराव
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,जो जीवन मरणाच्या चक्रातून सोडवतो तो सर्वश्रेष्ठ देव होय,बाकी सगळे नाथिलें म्हणजे लटके किंवा खोटे आहे.पुण्यप्रतापी असा श्रीराम सर्व लोकांमध्ये प्रसिध्द असून प्रतापी हे नांव केवळ राघवालाच शोभून दिसतें.तो श्रीराम रामदासाचा स्वामी आहे.
'''अभंग---197'''
अणुपासुनि जगदाकार ।ठाणठकार रघुवीर
रामाकार जाहली वृत्ती । द्रृश्याद्रृश्य नये हातीं
रामीं हरपलें जग । दास म्हणे कैंचे मग
'''भावार्थ---'''
अणुपासून जगातील सर्व ठिकाणी रघुवीर व्यापून राहिला आहे,एकदां वृत्ती राम स्वरुपांत विलीन झाली कीं,दिसणारें आणि न दिसणारें सर्व विश्व हरपून जाते,केवळ रामरूपच अंतर-बाह्य व्यापून उरतें.
'''अभंग---198'''
राज्य जालें रघुनाथाचें । भाग्य उदेलें भक्तांचें
कल्पतरु चिंतामणी । कामधेनूची दुभणी
परिस झालें पाषाण । अंगिकार करी कोण
नाना रत्नांचे डोंगर । अमृताचें सरोवर
पृथ्वी अवघी सुवर्णमय । कोणीकडे न्यावें काय
ब्रह्मादिकांचा कैवारी । रामदासाच्या अंतरीं
'''भावार्थ---'''
श्रीराम हे ईच्छीलें फळ देणारा कल्पतरु ,चिंतामणी किंवा कामधेनू असून रघुनाथाचे राज्य येतांच भक्तांचे भाग्य उदयास आले.रामराज्यांत सर्वच पाषाणांचे परिस बनले असतां ,त्यांचा लोभ कोणाला वाटणार?रामराज्यांत सर्वच डोंगर रत्नांचे बनले आणि सरोवरे अमृताची बनली,अवघी पृथ्वी सुवर्णमय झाली.अशा समृध्द रामराज्यांत कुणालाही काहिही कोठेही नेण्याची अभिलाषाच राहिली नाही .असा हा ब्रह्मदेवापासून सामान्य जनांच्या कामना पूर्ण करणारा श्री राम आपल्या अंतरंगांत वास करतो असे संत रामदास या अभंगात म्हणतात.
'''अभंग---199'''
स्वामी माझा ब्रह्मचारी । मातेसमान अवघ्या नारी
उपजतांबाळपणीं । गिळूं पाहे वासरमणि
आंगीं शेंदुराची उटी ।स्वयंभ सोन्याची कांसोटी
कानीं कुंडलें झळकती । मुक्तमाळा विराजती
स्वामीकृपेची साउली ।रामदासाची माउली।।
'''भावार्थ---'''
हा संत रामदासांचा आपले स्वामी श्री मारुती यांच्यावर लिहिलेला अभंग आहे. या अभंगांत ते म्हणतात आपले स्वामी ब्रह्मचारी असून सर्व स्रिया त्यांना मातेसमान आहेत. जन्म होतांच जेव्हां श्री मारुतीने आकाशातील लालभडक सूर्यबिंब पाहिलें आणि हे फळच आहे असे समजून ते खाण्यासाठी सूर्याकडे झेप घेतली.संत रामदास म्हणतात,श्री मारुतीरायांनी अंगावर शेंदुराची उटी लावली असून सोन्याची स्वयंभू लंगोटी परिधान केली आहे.त्यांच्या कानांत कुंडलें झळकत असून गळ्यामध्यें मोत्याच्या माळा शोभून दिसत आहेत.संत रामदास म्हणतात,श्रीमारुती आपली माउली असून त्यांच्या कृपेची साउली आपल्यावर आहे.
'''अभंग---200'''
पडतां संकट जीवां जडभारी ।
स्मरावा अंतरी बलभीम
बलभीम माझा सखा सहोदर ।
निवारी दुर्धर तापत्रय
तापत्रय बाधा बाधूं न शके काहीं ।
मारुतीचे पायीं चित्त ठेवा
ठेवा संचिताचा मज उघडला ।
कैवारी जोडला हनुमंत
हनुमंत माझें अंगीचें कवच ।
मग भय कैचें दास म्हणे
'''भावार्थ---'''
संत रामदासांची मारुतीराया वरील उत्कट भक्ती या अभंगांत दिसून येते.ते म्हणतात जीवावर बेतलेले कोणतेही मोठे संकट आले असतां बलभीमाचे स्मरण करावे .बलभीम आपला सखा ,सहोदर म्हणजे बंधू असून तापदायक अशा कठिण संकटांचे निवारण करतो.बलभीम आधिदैविक, आध्यात्मिक, आधिभौतिक अशा तापत्रयापासून मुक्तता करतो.मारुतीच्या चरणाशीं चित्त जडले असतां तिनही तापांची बाधा होत नाही.ढभहनुमंता सारखा कैवारी जोडल्यामुळे आपणास संचिताचा ठेवा सांपडला असून हनुमंताच्या कृपेचे कवच लाभल्यामुळें कसलेही भय उरले नाही असे संत रामदास खात्रीपूर्वक सांगतात.
'''अभंग---201'''
नांव मारुतीचे घ्यावें । पुढे पाऊल टाकावें
अवघा मुहूर्त शकून । हृदयीं मारुतीचे ध्यान
जिकडे जिकडे जाती भक्त। पाठीं जाय हनुमंत
राम उपासना करी। मारुती नांदे त्यांचे घरीं
दास म्हणे ऐसें करा । मारुती हृदयीं धरा
'''भावार्थ---'''
मनामध्ये मारुतीचे सतत ध्यान लागलेलें असेल तर शुभभशुभ शकून पाहाण्याची गरजच नाही. मारुतीचे नामस्मरण करून कोणत्याही कार्याची सुरवात करण्यासाठी पाऊल पुढे टाकावें कारण हनुमंताचे भक्त जेथेजेथे जातात तेथेतेथे हनुमंत पाठिराखा असतो.रामाची उपासना करणार्या भक्तांच्या घरी मारुतीरायाचा सतत वास असतो.संत रामदास भक्तांना अत्यंत कळकळीने उपदेश करीत आहेत की,त्यांनी सतत मारुतीचे ध्यान करावें.
'''अभंग---202'''
येई येई हनुमंता । माझे अंजनीच्या सुता ।।
तुझी पाहतो मी वाट । प्राणसखया मजला भेट ।।
तुजवांचोनि मज आतां । कोण संकटीं रक्षिता ।।
नको लावूं तूं उशीर । दास बहू चिंतातुर ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास अत्यंत चिंतातुर मनाने हनुमंताची वाट बघत आहेत.आपण संकटांत सापडलो असून दसरा कोणिही रक्षण करणारा नाही,अशा वेळीं उशीर न करतां अंजनीसुताने धाऊन यावे आणि आपला प्राणसखा असलेल्या हनुमंतांनी आपणास तातडीने भेटावें अशी कळकळीची विनंती संत रामदास करीत आहेत.
'''अभंग---203'''
कष्टी झाला जीव केली आठवण ।
पावलें किराण मारुतीचें
संसारसागरीं आकांत वाटला ।
भुभु:कार केला मारुतीनें
मज नाही कोणी मारुती वांचोनी ।
चिंतिता निर्वाणीं उडी घाली
माझे जिणें माझ्या मारुतीं लागलें।
तेणें माझें केले समाधान
उल्हासले मन देखोनि स्वरूप ।
दास म्हणे रूप राघवाचें
'''भावार्थ---'''
संत रामदास या अभंगात म्हणतात,जीव कष्टी झाल्यानें मारुतीची आठवण झाली आणि आनंदाची गोष्ट अशी की, आठवण होतांच मारुतीनें उड्डाण केले. संसारसागरांत माजलेला आकांत पाहून मारुतीने मुखानें प्रचंड आवाज केला.आपणास मारुती शिवाय कोणी तारणारा नाही, निर्वाणिच्या (संकटाच्या अंतिम क्षणीं )मारुतिचे स्मरण करतांच तो धावत येऊन रक्षण करतो.आपले सारे जीवन मारुतिला अर्पण केले की,मन निश्चिंत होऊन मनाचे समाधान होते.राघवाच्या दासाचे स्वरूप पाहून मन उल्हसित( आनंदित )होते.
'''अभंग---204'''
मेरूचीया माथां देऊनिया पाव ।
जात असे राव कैलासींचा
कैलासींचा राव अक्रावा क्षोभला ।
देशधडी केला लंकानाथ
लंकेच्या चोहटा मांडियेला खेळ ।
आगीचे कल्लोळ घरोघरीं
जाळियेलीं घरें सुंदर मंदिरें ।
पावला कैवारें जानकीच्या
जानकीचा शोक दुरी दुरावला ।
यशवंत जाला निजदास
'''भावार्थ---'''
मेरू पर्वताच्या शिखरावर निवास करणारा शिवशंकर(कैलासींचा राणा ) अत्यंत क्रोधायमान झाला.हा अकरावा रूद्र मारूतिच्या रुपानें प्रकट झाला आणि त्याने लंकानाथ रावणाला देशोधडीला लावलें.त्याने लंकेमध्यें उघडपणे खेळ मांडला,घरोघरी अग्नीच्या ज्वाळांनी कहर केला.घरें सुंदर मंदिरें जळून खाक झाली.जानकीचा कैवारी बनून त्याने जानकीचा शोक दूर केला.रामाचा दास हनुमान यशवंत झाला.
'''अभंग---205'''
पावावया रघुनाथ । जया मनीं वाटे आर्त ।
तेणें घ्यावा हनुमंत । करील भेटी
हनुमंत मी नमी । मज भेटविलें रामी ।
विघ्नांचिया कोटी श्रेणी । अंतरोनी
राम उपासकांवरी ।अतिप्रेम पडिभरी ।
होऊनिया कैवारी । निवारी दु:ख
रामीरामदासीं श्रेष्ठ । सिध्दसिध्दासी वरिष्ठ ।
भवाचा भरियेला घोंट । स्मरणमात्रें
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,ज्यांच्या मनामध्ये रामभेटीची उत्कट आर्तता असेल त्यांनी रघुनाथाची कृपा होण्यसाठी हनुमंताची उपासना करावी.आपण हनुमंताची विनवणी केली आणि हनुमंतांनी रामाची भेट घडवली,त्या मध्ये आलेली सर्व विघ्ने निवारून हनुमंतांनी रामभेट घडवून आणली.राम उपासकांवरील अतिप्रेमामुळे त्यांचा कैवारी बनून हनुमंत त्यांची दु:खे निवारण करतो.रामदासांमधील सर्वश्रेष्ठ आणि सिध्दांमध्ये वरिष्ठ सिध्द अशा हनुमंताचे केवळ स्मरण केल्यानें संसार तापापासून सुटका होते.
'''अभंग---206'''
मुख्य प्राणासी पुजिलें । रामदर्शन घडलें
तुम्ही पहा हो मारुती । रामभक्तांचा सारथी
देव अंजनीनंदन । रामदासी केलें ध्यान
'''भावार्थ---'''
मारुती हा रामाचा मुख्य प्राण असून त्याची पूजा करतांच रामदर्शन घडलें .संत रामदास म्हणतात, भाविकांनी मारुतीचे दर्शन घ्यावे कारण तो रामभक्तांचा सारथी आहे.त्या अंजनीनंदन मारुतीचे आपण सतत ध्यान करतो .
'''अभंग---207'''
कपिकुळाचें भूषण । चित्त रामाचें तोषण
धन्य साधू हा हनुमंत । ज्ञान वैराग्य सुमंत
रामरंगीं रंगे चित्त । अखंडित सावचित्त
दास म्हणे मी लेकरूं । विस्तारवी बोधांकूरू
'''भावार्थ---'''
वानरकुळाचे भूषण असलेल्या हनुमन्ताचे चित्त सतत श्रीरामाला प्रसन्न करण्यांत मग्न असते.ज्ञान, वैराग्य आणि सुबुध्दी असलेला हा हनुमंत एक साधुपुरुष आहे.तो सतत सावधान राहून आपले चित्त जराही विचलित होऊं न देता रामभजनांत रंगून जातो.संत रामदास म्हणतात, आपण हनुमंताचे लेकरु असून त्यांच्या उपदेशाचा विस्तार (प्रसार ) करतो.
'''अभंग---208'''
पंढरिऐसें तिन्हीं ताळीं ।क्षेत्र नाहीं भूमंडळीं
दुरूनि देखतां कळस । होय अहंकाराचा नाश
होतां संताचिया भेटी । जन्ममरणा पडे तुटी
चंद्रभागेमाजीं न्हातां । मुक्ति लाभे सायुज्यता
दृष्टीं नपडे ब्रह्मादिकां । प्राप्त जालें तें भाविका
रामदासा जाली भेटी । विठ्ठलपायीं दिधली मिठी
'''भावार्थ---'''
पंढरीसारखे तीर्थक्षेत्र आकाश, पृथ्वी,पाताळ या तिन्ही लोकांत ,सर्व भूमंडळावर शोधूनही सापडणार नाही.विठ्ठल मंदिराचा कळस दूरून बघितला तरी भाविकाच्या अहंकाराचा संपूर्ण नाश होतो.येथील संतांच्या भेटी होतांच जन्ममरणाची बंधने तुटून पडतात.चंद्रभागेमध्यें स्नान करतांच भाविकांना सायुज्य मुक्तीचा(पांडुरंगाच्या निकट सानिध्याचा )लाभ होतो.ब्रह्मादिदेवांच्या दृष्टीसुध्दा पडणे कठिण अशा वैकुंठपदाची प्राप्ती होते.संत रामदास म्हणतात,आपली पंढरीच्या पांडुरंगाची भेट झाली आणि त्याच्या पायाला मिठीच घातली.
'''अभंग---209'''
पंढरी नव्हे एकदेशी । विठ्ठल सर्वत्र निवासी ।।
आम्हीं देखिला विठोबा । आनंदे विटेवरीं उभा ।।
तेथे दृश्यांची दाटी मोठी । पाहतां रुक्मिणी दिसे दृष्टी ।।
रामदासीं दर्शन जालें ।आत्मविठ्ठला देखिलें ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,पंढरी एकदेशी नाही कारण विठ्ठ्लाचा सर्वत्र निवास आहे.पाडुरंगाला स्थळ काळाची बंधन नाही.आनंदाने विटेवर उभा असलेल्या विठोबाचे दर्शन आपल्याला झाले.विठोबाच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी झाली आहे,रुक्मिणीदेवीचे दर्शन घडते.पंढरीमध्यें आत्मविठ्ठलाचे दर्शन आपल्याला घडलें.
'''अभंग---210'''
राम कृपाकर विठ्ठ्ल साकार । दोघे निराकार एकरूप ।।
आमुचिये घरीं वस्ति निरंतरीं । हृदयीं एकाकारी राहियेले ।
रामदास म्हणे धरा भक्तिभाव । कृपाळु राघव पांडुरंग ।।
'''भावार्थ---'''
श्रीराम भक्तांवर कृपा करणारा असून विठ्ठ्ल भक्तांच्या हाकेला धावून जाऊन प्रत्यक्ष मदत करणारा आहे.दोघांचेही स्वरूप एकरूप म्हणजे निराकार आहे.ते हृदयांत एकाकार होऊन राहिले आहेत.त्यांची हृदयातिल वस्ती नरंतर आहे,असे सांगून संत रामदास म्हणतात भाविकांनी मनांत भक्तिभाव धरला तर राघव व पांडुरंग दोघेही कृपेचे सागर आहेत.
'''अभंग---211'''
जें कां चैतन्य मुसावलें विटेवरी वासांवलें ।।
तो हा विठ्ठल उभा राहे । समचरणीं शोभताहे ।।
रामीरामदासीं पाहिलें । विठ्ठल आत्मया देखिलें ।।
'''भावार्थ---'''
विठ्ठलाचे विटेवरील रूप पाहून वाटते कीं, प्रत्यक्ष चैतन्य मुशीमध्ये ओतून हे रुपडे साकार झाले आहे.विटेवर समचरणीं उभा असलेला पांडुरंग शोभून दिसत आहे असे सांगून संत रामदास म्हणतात, विठ्ठलाच्या स्वरूपांत प्रत्यक्ष आत्मरूपच पाहिलें.
'''अभंग---212'''
माझें मानस विटेवरी । विठ्ठलचरणीं निरंतरीं ।।
पंढरपुरीं मनोरथ ज्याचा । धन्य धन्य तो देवाचा ।।
जो जो पंढरीस गेला । तेणे कळिकाळ जिंकिला ।।
रामदास म्हणे पंढरी । साधनेविण तारी ।।
'''भावार्थ---'''
विटेवरील विठ्ठलाच्या चरणांशीं आपले मन सदा सर्वकाळ गुंतून राहिलें आहे.पंढरपुरीच्या विठ्ठलाच्या भेटीची ज्याला आस लागली आहे तो दैवी भक्त असून धन्य होय,जो भक्त पंढरीची वारी करतो त्याला कळिकाळाचे भय नाही,त्याची जन्म-मरणाची वारी चुकते. संत रामदास म्हणतात, कोणत्याही साधनेशिवाय पंढरीची वारी भाविकांना तारून नेते.
'''अभंग---213'''
लांचांवोनि भक्तिलोभा । असे वाळवंटीं उभा ।
पदकी इंद्रनीळशोभा । दिशा प्रभा उजळती ।।
भक्तें पुंडलिकें गोविला । जाऊं नेदी उभा केला ।
विटें नीट असे ठाकला । भीमातीर वाळुवंटीं ।।
केवढें भाग्य पुंडलिकाचें । उभें दैवत त्रिलोकींचें ।
की जें तारूं भवसागरींचें । भीमातीरीं विनटलें ।।
एकें पुंडलिकें करुनी जोडी । आम्हा दिधली कल्पकोडी ।
तुटली संसारसांकडी । रामदास म्हणतसे ।।
'''भावार्थ---'''
भक्तांच्या भक्तिप्रमासाठीं वेडा झालेला पांडुरंग चंद्रभागेच्या वाळवंटांत उभा आहे.पांडुरंगाच्या गळ्यामधील वैजयंती माळेच्या पदकाच्या निळसर प्रभेच्या तेजानें सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत.भक्त पुंडलिकाच्या भक्तीप्रेमाने पांडुरंग बंधनांत पडला आहे. विटेवर समचरणांत उभाआहे,हे भक्तिप्रेम डावलून जाऊ शकत नाही.भक्त पुंडलिकाचे भाग्य एव्हढें मोठे आहे की,त्रिलोकेचे दैवत त्याच्यासाठी तिष्ठत उभे आहे.संत रामदास म्हणतात, संसारसागर तारून नेणारे पांडुरंग रुपी तारू भीमेतिरी शोभून दिसत आहे.पुंडलिकाच्या भाग्यामुळे आपल्याला पांडुरंगाच्या कृपा प्रसादाचा चिरंतन लाभ झाला आहे आणि संसार बंधनाची साखळी तुटून पडली आहे.
''अभंग---214'''
कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ।।
काय मागतों गांठोडी । बोलसीना धरली गुडी ।।
आशा वैभवाची नाही । भिऊं नको वद कांहीं ।।
नलगे मज धन दारा ।वेगे लोचन उघडा ।।
दास म्हणे वर पाहे । कृपा करूनी भेटावें ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास या अभंगात विठ्ठलाला आळवित आहेत. विठुराया आपल्याशी बोलत नाही, मौनरुप धारण केले असून मुखांत गुळणी धरली आहे. आपण विठुरायाकडे मौल्यवान धनाचे गाठोड , वैभव, पत्नी यापैकीं कांहीच मागत नाही. तेव्हां न घाबरता त्यांनी आपले डोळे उघडून कृपादृष्टीने पहावें , एकदां तरी भेटावे अशी कळकळीची विनंती संत रामदास विठ्ठलाला करीत आहेत.
''अभंग---215'''
सोनियाचा दिवस जाला । पांडुरंग रंगी आला ।।
मनी आतां सावध होई । प्रेमरंगी रंगुनि राहीं ।।
बोल कैसा सुपरित कांहीं । अनुसंधान विठ्ठलपायीं ।।
दास म्हणे हेचि युक्ती । एक देवासी चिंतिती ।।
'''भावार्थ---'''
आज सोनियाचा दिवस आला आहे कारण आज पांडुरंग रिंगणांत आले असून भक्तां सोबत रंगात आले आहेत.आतां सावध चित्ताने या प्रेमरंगात रंगून जावे,विठ्ठलाच्या पायीं सारे लक्ष केंद्रीत करुन एकाग्रतेनें लीन होऊन रहावें संत रामदास सागतात , देवाचे चिंतन करण्याची ही एकच युक्ती आहे.
''अभंग---216'''
आम्ही देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं ।।
भावभक्ति श्रवण मनन । निदिध्यास साक्षात्कारपण ।।
चिच्छक्ति धर्मनदी । तरलों ब्ह्मास्मिबुध्दि ।।
तेथिंचा अहंकार तेंचि पोंवळी । त्यजोनी प्रवेशलों राउळीं ।।
रामदासी दर्शन जालें । आत्म्या विठ्ठलातें देखिलें ।।
'''भावार्थ---'''
या अभंगांत संत रामदास आपणास पंढरीच्या आत्मारुप विठ्ठलाचे दर्शन कसे घडले याचे वर्णन करीत आहेत.चिच्छत्ति धर्मनदी तरून जाण्यासाठी अहंम् ब्ह्मास्मि या वचनाचा उपयोग करावा लागला.त्यासाठी भावपुर्ण भक्तिची,श्रवण मननाची आणि निदिध्यास यांची कास धरावी लागली.या उपासनेनंतर साक्षात्काराचे वरदान मिळाले. या साक्षात्कारीपणामुळे निर्माण झालेला अहंकार म्हणजे या धर्मनदीतील मोल्यवान पोवळी ,त्यांचा त्याग करुन पैलतीरावरील मंदिरांत प्रवेश केला आणि सच्चिदानंद परमेश्वराचे दर्शन घडलें.प्रत्यक्ष आत्मरूप विठोबा डोळ्यांनी बघावयास मिळाला.
''अभंग---217'''
राम अयोध्येचा वासी । तोचि नांदे द्वारकेसी ।।
कृष्ण नामातें धरिलें । बहु दैत्य संहारिँलें ।।
सखया मारुतीलागुनी । रूप दावी चापपाणी ।।
पुढे भूभार उतरिँला । पांडवासी सहाय जाला ।।
आतां भक्तांचियासाठी । उभा चंद्रभागेतटी ।।
राम तोचि विठ्ठल जाला । रामदासासी भेटला ।।
'''भावार्थ---'''
श्रीराम अयोध्येचा राजा,त्याने आपला परमभक्त मारुतिला आपले धनुष्यबाणधारी रुप दाखवलें.तोच द्वापारयुगांत कृष्ण हे नाम धारण करून द्वारकेंत नांदत होता. पृथ्वीवरील दुष्ट,पापी राक्षसांचा संहार करून भूभार हलका केला,पांडवांचे राज्य कपटाने हरण करणार्या कौरवांचा संहार करण्यासाठी त्यांचा साह्यकर्ता झाला.आणि आतां कलियुगांत भोळ्याभाविक भक्तांसाठी चंद्रभागेतटी कर कटीवर ठेवून उभा आहे .संत रामदास म्हणतात श्रीराम हाच विठ्ठल होऊन आपणास भेटला ,
''अभंग---218'''
सहज बरवा सहज बरवा । सहज बरवा विठोबा माझा ।।
सहज सांवळा दिगंबर ।सहज कटीं कर ठेऊनि उभा ।।
रामीरामदास म्हणे ।सहज अनुभव तोचि जाणे ।।
'''भावार्थ---'''
सावळ्यारंगाचा , दिशा हेंच वस्त्र ज्याने परिधान केले आहे असा आपला विठोबा दोन्ही कर कटीवर ठेवून विटेवर सहजपणे उभा आहे. श्रीरामाचे दास रामदासस्वामी म्हणतात,सहजपणे आपोआप येणाऱ्या अनुभूती फक्त तोच विठोबा जाणू शकतो.
''अभंग---219'''
शंकर--खंडोबा--भैरव
नमो नमो सदाशिवा । गिरिजापति महादेवा ।।
शिरी जटेचा हा भार । गळां वासुकीचा हार ।।
अंगा लावूनिया राख । मुखी रामनाम जप। ।।
भक्ता प्रसन्न नानापरी । अभंयकर ठेऊनि शिरी ।।
दास म्हणे शिवशंकरा । दुबळ्यावरी कृपा करा ।।
'''भावार्थ---'''
मस्त्कावर जटांचा भार असलेला,गळ्यामध्यें वासुकी नावाच्या सापाचा हार घातलेला,अंगाला राख फासून सदासर्वकाळ रामनामाचा जप करणारा,भोळ्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांच्या मस्तकावर आपला अभंयंकर कर ठेऊन आशिर्वाद देणारा अशा गिरिजापती सदा पवित्र ,महादेवाला नमन करून संत रामदास शिवशंकराला आपल्यासारख्या दुबळ्या भक्तावर कृपा करावी अशी विनंती करीत आहेत.
''अभंग---220'''
माझा कुळस्वामी कैलासीचा राजा ।
भक्ताचिया काजा पावतसे
पावतसे दशभुजा उचलून । माझा पंचानन कैवारी ।।
कैवारी देव व्याघ्राच्या स्वरूपें ।
भूमंडळ कोपें जाळूं शके
जाळूं शके सृष्टि उघडितां दृष्टी ।
तेथें कोण गोष्टी इतरांची
इतरांची शक्ति शंकराखालती ।
वांचविती क्षिती दास म्हणे
'''भावार्थ---'''
आपल्या कुळाचा स्वामी कैलासीचा राजा शिवशंकर याचा महिमा या अभंगांत संत रामदासांनी वर्णन केला आहे.पंचानन (पाच मुखे असलेला )शंकर आपल्या दहा भुजा उचलून भक्तांचे रक्षण करून त्यांचे मनोरथ पूर्ण करतो.तो भक्तांचा कैवारी असून वाघाच्या स्वरूपांत सर्व भूमंडळ केवळ एका द दृष्टीक्षेपात जाळू शकतो,सर्व सृष्टी डोळे उघडतांच जाळून राख करण्याचे सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे.शिवशंकराच्या सामर्थ्याची तुलना इतर कोणत्याही देवदेवतांशी होऊ शकणार नाही.पृथ्वीचे पालन करणारे श्री विष्णुं सुध्दा महादेवाची बरोबरी करु शकणार नाही असा विश्वास संत रामदास व्यक्त करतात.
''अभंग---221'''
पृथ्वी अवघीं लिंगाकार । अवघा लिंगाचा विस्तार ।।
आतां कोठें ठेवूं पाव । जेथे तेथे महादेव ।।
अवघा रुद्रची व्यापिला ।ऐसे देवचि बोलिला ।।
दासे जाणोनिया भला ।देह देवार्पण केला।।
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात, ही सर्व पृथ्वी लिंगाचा विस्तार असल्याने लिंगाकार आहे.सर्व स्थळे महादेवाने व्यापलेली आहेत, एकच रूद्र सगळीकडे व्यापून राहिला आहे ,पाय ठेवायला देखील जागा नाही.हे देवाचे वचन आहे असे जाणून आपण आपला देह त्या सर्वव्यापी परमेश्वराला अर्पण केला.
''अभंग---222'''
देव शिवाचा अवतार । जाउनि बसला गडावर ।।
एक निळ्या घोड्यावर । एक ढवळ्या नंदीवर ।।
एका विभूतीचे लेणें । एका भंडारभूषणें ।।
रामदासी एक जाला । भेदभाव तो उडाला ।।
'''भावार्थ---'''
देव खंडोबा शिवाचा अवतार असून तो जेजुरीच्या गडावर वास्तव्य करुन आहे,खंडोबा एका निळ्या घोड्यावर स्वार झाले आहेत तर शिवशंकर धवल नंदीवर विराजमान झाले आहेत.एक महान विभूतीचे लेणे असून भंडारा हे भूषण मानतात.संत रामदास भेदभाव विसरून त्यांच्याशी एकरूप झाले आहेत.
'''अभंग---223'''
सोरटीचा देव माणदेशी आला ।
भक्तीसी पावला सावकाश ।।
सावकाश जाती देवाचे यात्रेसी
होति पुण्यराशी भक्तिभावें ।।
भक्तिभावे देवा संतुष्ट करावें
संसारी तरावें दास म्हणे ।।
'''भावार्थ---'''
सौराष्ट्रातील सोरटी सोमनाथ भाविकांच्या भक्तिप्रेमामुळे महाराष्ट्रातिल माणदेशी आला आणि सावकाश भक्तांना पावन केले.जे एकाग्रचित्तानें सावकाशपणे यात्रेला जातात ते मनातिल भक्तिभावामुळे पुण्यराशी बनतात.संत रामदास म्हणतात भक्तांनी आपल्या प्रेमभावाने देवाला संतुष्ट ,प्रसन्न करावे आणि हा संसार सागर तरून जावा, जन्म मरणाच्या वारीतून आपली सुटका करून घ्यावी .
'''अभंग---224'''
अनंत युगाची जननी । तुळजा रामवरदायिनी ।
तिचे स्वरूप उमजोनी । समजोनि राहे तो ज्ञाता ।।
शक्तिविणें कोण आहे । हें तो विचारूनि पाहे ।
शक्तिविरहित न राहे । यशकीर्त्तिप्रताप ।।
शिवशक्तिचा विचार । अर्धनारीनटेश्वर ।
दास म्हणे हा विस्तार । तत्वज्ञानी जाणती ।।
'''भावार्थ---'''
श्रीरामाला वर देणारी तुळजापूरची भवानी अनंत युगाची माता आहे. तुळजाभवानीचे खरे स्वरूप जो जाणून घेतो आणि सतत लक्ष्यांत ठेवतो तो खरा जाणकार (ज्ञाता ) समजावा, या जगांत कोणती गोष्ट शक्तिशिवाय राहू शकते असा विचार केल्यास यश, किर्ति ,पराक्रम या पैकी एकही गोष्ट शक्तिशिवाय राहू शकत नाही असे ल्क्ष्यांत येते. शिव आणि शक्ति म्हणजेच अर्धनारी नटेश्वर होय.हे विश्व शिवशक्तिचाच विस्तार आहे हे तत्वज्ञानी लोक जाणतात असे संत रामदास या अभंगात स्पष्ट करतात .
'''अभंग---225'''
सोहं हंसा म्हणिजे तो मी मी तो ऐसे ।
हे वाक्य विश्वासे विवरावें ।।
विवरावें अहंब्रह्मास्मि वचन ।
ब्रह्म सनातन तूंचि एक ।।
तूंचि एक ब्रह्म हेचि महावाक्य ।
परब्रह्मीं ऐक्य अर्थबोध ।।
अर्थबोध रामीरामदासीं जाला ।
निर्गुण जोडला निवेदनें ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास साधकाने निर्गृण भक्ती कशी साध्य करावी या विषयी सांगत आहेत .सोहं म्हणजे मी परमात्म्याचा अंश असून तो म्हणजेच मी व मी म्हणजेच तो या वाक्याचा खोलवर विचार करून चिंतन करावे .सनातन (अनंत काळापासून चालत आलेले) ब्रह्म तूच आहेस हे महावाक्य असून आत्मा परमात्मा एकरूप आहेत हाच अर्थबोध होतो ,संत रामदासांना हा अर्थबोध झाला आणि ते निर्गुणासी जोडले गेले.
'''अभंग---226'''
मायेभोवती भोंवावें तरी तिने कुरवाळावें ।।
संत एकटा एकला । एकपणाहि मुकला ।।
त्यासी माया असोनि नाहीं। ।आपपर नेणें काहीं ।।
रामीरामदासी माय । व्याली नाहीं चाटिल काय ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास साधकांना सांगतात, आपण मायेभोवती फेर धरला तरच ती आपल्याला कुरवाळून बंधनांत पाडते ,संत मायेच्या बंधनापासून अलग एकटे असतात म्हणून परमेश्वराशी एकरूप होतात व त्यांच्या एकांताचा सुध्दा अंत होतो ,त्यांच्या दृष्टीने माया असून नसल्या सारखीच असते .हे स्पष्ट करण्यासाठी संत रामदासांनी एक अगदी समर्पक उदाहरण दिले आहे ,रामदासी माय जर व्यालीच नाही तर वासराला चाटण्याचा मोहच नाही .संसारापासून मुक्त असलेले संत संसाराच्या मोह बंधनात अडकत नाहीत हेच ते स्पष्ट करतात .
'''अभंग---227'''
दृश्य सांडूनियां मागें । वृत्ति गेली लागवेगें ।।
माया सांडूनी चंचळ । जाला स्वरूपीं निश्चळ ।।
कांहीं भासचि नाडळे । वृत्ति निर्गुणीं निवळे ।।
चराचरातें सांडिलें । बहुविधें ओलांडिलें ।।
अवघें एकचि निर्गुण । पाहे वृत्तिच आपण ।।
रामदास सांगे खूण । वृत्ति तुर्येचें लक्षण ।।
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास वृत्तिची निवृत्ति कशी होते या विषयी बोलत आहेत . संसाराचा दृश्य पसारा सोडून वृत्ति वेगानें नघून जाते तेव्हा साधक चंचळ माया सोडून ईश्वर स्वरुपाशी स्थीर होतो ,सारे भास विरून जातात आणि वृत्ति निर्गुणामध्ये मिसळून जाते .मायेचे सर्व पाश ओलांडून,चराचर सृष्टीच्या पलिकडील निर्गुणाशी एकरुप होते . साधक केवळ वृत्तिरुपाने उरतो, हिच तुर्यावस्था होय असे संत रामदास म्हणतात ,
'''अभंग---228'''
ज्याचे नाम घेसी तोचि तूं आहेसी ।
पाहे आपणासी शोधूनियां ।।
शोधितां शोधितां मीपणचि नाहीं ।
मीपणाचें पाही मूळ बरें ।।
मूळ बरें पहा नसोनियां राहा ।
आहां तैसें आहां सर्वगत ।।
सर्वगत आत्मा तोचि तूं परमात्मा ।
दास अहं आत्मा सांगतसे ।।
'''भावार्थ---'''
साधक स्वता:चा शोध घेत असतांना त्याला मी पणा कोठे सापडतच नाही,मी पणाचे मूळ न सापडल्याने मी पणाच नाही अशी त्याची धारणा होऊन आपण सर्व ठिकाणी व्यापलेले आत्मतत्व आहोत याचा साक्षात्कार होतो .सर्वत्र व्यापून असलेला आत्मा हाच परमात्मा असून तोच तूं आहेस असे संत रामदास सांगतात .मी देह नसून अविनाशी आत्मतत्व आहोत हे जाणून घेतले पाहिजे .
'''अभंग---229'''
दिसें तें नासेल सर्वत्र जाणती।
या बोला व्युत्पत्ति काय काज ।।
काज कारण हा विवेक पाहिजे ।
तरीच लाहिजे शाश्वतासी ।।
शाश्वतासी येणें जाणें हें न घडे ।
आकार न मोडे दास म्हणे ।।
'''भावार्थ---'''
जे जे डोळ्यांना दिसते ते सर्व नाशवंत आहे हे सर्वजण जाणतात ,त्या साठी विशेष व्याकरण पटुत्वाची गरज नाही .प्रत्येक घटनेला कांहीतरी कारण असते तसेच घडणाय्रा प्रत्येक घटनेचा परिणाम अटळ असतो हे जाणून घेतले तरच शाश्वत आणि अशाश्वत गोष्टींचा उलगडा होतो.संत रामदास म्हणतात,आकाराला आलेली प्रत्येक वस्तु बदलत असते,नाश पावते आणि परत वेगळ्या स्वरूपांत निर्माण होते .शाश्वतासी बदल किंवा विनाश संभवत नाही.
'''अभंग---230'''
छायेमाजी छाया लोपे । तरि काय परूष हारपे ।।
तैसा देह लोपतां । कदा न घडे मरण ।।
खेळाअंतीं डाव हारपत । तरी कां नटासि आला मृत्य ।।
रामदासी रामीं राम । जन्म मरण कैंचा भ्रम ।।
'''भावार्थ---'''
जन्म मरण हा केवळ मनाचा खेळ किंवा भ्रम आहे हे पटवून देण्यासाठी संत रामदास अत्यंत समर्पक उदाहरणे देतात .ज्या प्रमाणे सावली हा छाया प्रकाशाचा खेळ आहे,त्या प्रमाणे जन्म मृत्यू हा मनाचा खेळ आहे .रंगभुमीवर काम करणारा नट नाटकातील कथेप्रमाणे हरपला तरी तो नट मरण पावला असे होत नाही.देहाचा लोप झाला तरी मरण आले असे नाही कारण मी देह नसून आत्मस्वरुप आहे हे ज्याने जाणले तो अमर झाला .
'''अभंग---231'''
गेला स्वरूपाच्या ठायां । तिकडे ब्रह्म इकडे माया ।।
दोहींमध्यें सांपडलें । मीच ब्रह्मसें कल्पिलें ।।
ब्रह्म निर्मळ निश्चळ । माया चंचळ चपल ।।
तिकडे वस्तु निराकार । इकडे मायेचा विस्तार ।।
पुढे ब्रह्म मागें माया । मध्ये संदेहाची काया ।।
रामीरामदास म्हणे । इतुकें मनाचें करणें ।।
'''भावार्थ---'''
साधक स्व-स्वरुपाचा शोध घेण्यास निघाला तेव्हां तो एकीकडे ब्रह्म आणि दुसरीकडे माया असा दोन्हीमध्यें सापडला आणि आपणच ब्रह्म आहोत अशी कल्पना केली.ब्रह्म निर्मळ ,निराकार आणि निश्चळ(चंचल नसणारे)तर माया चंचळ आणि चपळ ,पुढे ब्रह्म ,मागे माया त्यामध्ये साधक सापडून त्याच्या मनांत संदेह़ निर्माण होतो . संत रामदास म्हणतात, या सगळ्या मानसिक क्रिया आहेत.
'''अभंग---232'''
ब्रह्म हे जाणावें आकाशासारिखें ।
माया हे वोळखें वायू ऐसी
वायू ऐसी माया चंचल चपळ ।
ब्रह्म ते निश्चळ निराकार
निराकार ब्रह्म नाही आकारलें ।
रुप विस्तारलें मायादेवी
मायादेवी जाली नांव आणि रूप ।
शुध्द सस्वरूप वेगळेचि।
वेगळेचि परी आहे सर्वां ठायीं ।
रिता ठाव नाही तयांविणें
तयाविणें ज्ञान तेचि अज्ञान ।
नाहीं समाधान ब्रह्मेविण
ब्रह्मेविण भक्ति तेचि पै अभक्ति।
रामदासी मुक्ति ब्रह्मज्ञानी
'''भावार्थ---'''
या अभंगांत संत रामदास माया आणि ब्रह्म यांचे स्वरूप स्पष्ट करून सांगत आहेत ,ब्रह्म हे आकाशासारखे निश्चळ, निराकार असून माया वायूसारखी अतिशय चपळ आणि चंचल आहे.ब्रह्म निराकार आहे म्हणजे त्याला कोणताही आकार नाही या उलट मायादेवी विविध नावांनी आणि रुपांनी खूप विस्तार पावली आहे .ब्रह्माचे स्वरुप अत्यंत शुध्द व सर्व वस्तुजातापेक्षा निराळे असूनही ते सर्व सजीव व निर्जीव सृष्टीला व्यापून राहिलें आहे,ब्रह्मतत्वाशिवाय अणूमात्रसुध्दां जागा रिकामी नाही.ब्रह्म म्हणजे परिपूर्ण ज्ञान असून त्या शिवाय ज्ञान म्हणजे अज्ञान होय .ब्रह्मतत्व जाणून घेतल्याशिवाय भक्ति ही केवळ अभक्ति आहे असे सांगून संत रामदास स्वप्रचितिने सांगतात की, आपणास ब्रह्मज्ञानानेच मुक्ति प्राप्त झाली .
'''अभंग---233'''
अनंताचा अंत पहावया गेलों ।
तेणें विसरलों आपणासी
आपणा आपण पाहतां दिसेना ।
रूप गवसेना दोहींकडें
दोहीकडे देव आपणची आहे।
संग हा न साहे माझा मज
माझा मज भार जाहला बहुत ।
देखतां अनंत कळों आला
कळों आला भार पाहिला विचार।
पुढें सारासार विचारणा
विचारणा जाली रामीरामदासीं ।
सर्वही संगासी मुक्त केलें
मुक्त केले मोक्षा मुक्तीची उपेक्षा ।
तुटली अपेक्षा कोणी एक
'''भावार्थ---'''
या अभगांत संत रामदास एका अनिर्वचनीय अनुभवाचे वर्णन करीत आहेत.अनंत ब्रह्मरुप परमात्म्याचे अंतिम स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतांना आपण आपले स्वरुपच विसरुन गेलो आहोत ,त्या अनंतरुपांत स्वता:चे रुपच सापडेनासे झालें. आपले स्वरुप ब्रह्म स्वरुपाशी एकरुप झाले आहे असा अनुभव येऊन आपण नि:संग झालो ,आपल्या अस्तित्वाचा भार आपल्यालाच सोसवेनासा झाला आणि सारासार विचार करतांना आपण आणि हे अनंत स्वरुप वेगळे नाही याची जाणिव झाल्याने आपण नि:संग बनलो मुक्तीची उपेक्षा करुन मोक्ष या कल्पनेपासून मुक्त झालो,सर्व अपेक्षा अनंत स्वरुपांत विलीन झाल्या.
'''अभंग---234'''
ओळखतां ज्ञान ओळखी मोडली ।
भेटी हे जोडली आपणासी
आपणासी भेटी जाली बहुदिसां ।
तुटला वळसा मीपणाचा
मीपणाचा भाव भावें केला वाव।
दास म्हणे देव प्रगटला
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात, जेव्हां चित्तात निखळ ज्ञानाचा झरा उगम पावला तेव्हां अज्ञान आपोआपच दूर झालें ,खूप दिवसांनी श्री रामाची भेट झाली आणि मीपणाच्या अहंकाराचा पडदा सहजपणें गळून पडला.श्रीरामा वरील अतूट भक्तिभावामुळे मी पणाचा भाव खोटा ठरला , श्री राम ज्ञानरूपाने प्रगट झाले.
'''अभंग---235'''
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं ।
जाणावा चतुरीं चोथादेहु
चौथे देहीं सर्वसाक्षिणी अवस्था ।
ऐसी हे व्यवस्था चौदेहांची
चौदेहांची गांठी शोधितां सुटली
विवेके तुटली देहबुध्दि
देहबुध्दी नाहीं स्वरूपीं पाहतां ।
चौथा देह आतां कोठें आहे
कोठे आहे अहंब्रह्म ऐसा हेत ।
देहीं देहातीत रामदास
'''भावार्थ---'''
मी म्हणजेच ब्रह्म असे जाणून घेऊन जो त्या बद्दल अभिमान बाळगतो तोच चौथा देह आहे,हे चतुराईने समजून घ्यावे असे संत रामदास म्हणतात.मन, बुध्दी ,अहंकार व चित्त हा चौथा देह असून ही सर्वसाक्षिणी, (विश्वातील सर्व घटनांचे अवलोकन करून त्यांची संगती लावू शकणारी असामान्य क्षमता )या अवस्थेला संत तुर्या अवस्था मानतात.जागृती, स्वप्न, सुषुप्ती (गाढ झोप)व चौथी तुर्या अवस्था मानली जाते.या अवस्थेत साधक गाढ झोपेतही नसतो आणि पूर्ण जाग्रतावस्थेतही नसतो ,या अवस्थेत प्रज्ञा जाग्रुत असून साधकाची अलौकिक प्रतिभा ,विचार शक्ती जाग्रुत होते .या अवस्थेत चौदेहाची गाठी सुटून देहबुध्दी विवेकाने लोप पावतें.अहंकार म्हणजेच मी पणाचा भाव लुप्त होऊन अहंब्रह्म म्हणजेच मी च ब्रह्म आहे याचा साक्षात्कार होतो.संत रामदास स्वप्रचितीने सागंतात की या अवस्थेत साधक देहांत असूनही देहातीत अवस्थेंत पोचतो, परब्रह्म स्वरूपाशी एकरुप होतो.
'''अभंग---236'''
मायेचे स्वरूप ब्रह्मी उद्भवलें ।
तिच्या पोटी आलें महतत्व
महतत्वीं सत्व सत्वीं रजोगुण ।
तिजा तमोगुण रजापोटीं
पोटां पंचभूतें तयांचिया आली ।
दास म्हणे जाली सृष्टि ऐसी
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास सृष्टी कशी निर्माण झाली या विषयी सांगत आहेत . मायेचे स्वरूप ब्रह्मरूपात प्रकट झाले आणि तिच्या पोटी महतत्वाचा जन्म झाला.महतत्वातून सत्वगुण व सत्वगुणांतून रजोगुण निर्माण झाला,रजोगुणातून तमोगुणाचा उदय झाला.तमोगुणातून पंचमहाभूते प्रगट झाली आणि पंचमहाभूतातून सर्व सृष्टी निर्माण झाली .
'''अभंग---237'''
स्वप्न वाटे सार तैसा हा संसार ।
पाहतां विचार कळोंलागे ।।
स्वप्न वेगींसरे संसार वोसरे ।
लालुचीच उरे दोहींकडे ।।
दास म्हणे निद्राकाळी स्वप्न खरें।
भ्रमिष्टासी बरें निद्रासूख ।।
'''भावार्थ---'''
स्वप्न हा मनातील कल्पनांचा खेळ ,केवळ आभास असतो तसा संसार आहे ,विचाराअंती हे कळून येते.स्वप्न जसे दिसते आणि वेगाने दिसेनासे होते ,तसाच संसार दिसतो आणि नासतो.मन मात्र लालचावल्या सारखे होते.संत रामदास म्हणतात निद्राकाळी स्वप्न खरें वाटते म्हणून भ्रम झालेल्या माणसाला निद्रासुख बरेंवाटतें.
'''अभंग---238'''
गळे बांधले पाषाणीं । आत्मलिंग नेणें कोणी ।।
जीव शिवाचें स्वरूप । कोण जाणें कैसें रूप ।।
लिंग चुकले स्वयंभ । धरिला पाषाणाचा लोभ ।।
रामीरामदास म्हणे । भेद जाणतीं शहाणे
'''भावार्थ---'''
जीव हे शिवाचे स्वरूप असे सर्वजण म्हणतात परंतू हे रुप प्रत्यक्ष कसे आहे हे कोणीच जाणत नाही,स्वयंभू लिंग समजून पाषाणाची पूजा करतात ,त्याचाच लोभ धरतात. संत रामदास म्हणतात,स्वयंभू लिंग आणि पाषाण यांतील भेद फक्त शहाणे लोकच जाणतात .
'''अभंग---239'''
अंत नाही तो अनंत । त्यासि दोरी करी भ्रांत ।।
ऐसें जनाचें करणें । कैसा संसार तरणें ।।
देव व्यापक सर्वांसी । त्यास म्हणती एकदेशी ।।
रामदासी देव पूर्ण । त्यासी म्हणती अपूर्ण ।।
'''भावार्थ---'''
दोरी बघून भ्रांती पडल्यामुळे दोरीलाच साप समजतो व भितीने गर्भगळित होतो ,अज्ञानामुळे सामान्य माणुस असे वर्तन करतो त्या मुळे त्याला संसार सागर तरून जाणे अवघड जाते असे सांगून संत रामदास म्हणतात की,देव सर्व सृष्टीत,अणुरेणूत व्यापून राहिलेला असूनही आपण त्याला स्थळ कांळाच्या बंधनांत अडकवतो .अनंत परमेश्वराची मूर्ती बनवून त्याची पूजा करतो.जो पूर्ण आहे त्याला अपूर्ण ,जो अविनाशी आहे त्याचे आवाहन व विसर्जन करतो.
'''अभंग---240'''
जन्मवरी शीण केला । अंत:काळीं व्यर्थ गेला ।।
काया स्मशानीं घातली । कन्यापुत्र मुरडलीं ।।
घरवाडा तो राहिला । प्राणी जातसे एकला ।।
धनधान्य तें राहिलें । प्राणी चरफडीत गेले ।।
इष्टमित्र आणि सांगाती । आपुलाल्या घरां जाती ।।
दास म्हणे प्राणी मेले । कांहीं पुण्य नाहीं केलें ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात, माणुस आयुष्यभर घरसंसार ,धनधान्य, सगेसोयरे,इष्टमित्र यांच्यासाठी कष्ट घेतो परंतू अंत:काळी सर्व व्यर्थ जाते .घरदार, धनधान्य सगळं सोडून प्राणी चरफडत एकटाच निघून जातो.देह स्मशानांत ठेवून सर्व सांगाती,मित्र, कन्यापुत्र तेथून निघून आप आपल्या घरी जातात .कोणतंही पुण्य त्याच्या कामी येत नाही.
'''अभंग---241'''
कल्पनेची भरोवरी । मन सर्वकाळ करी ।।
स्वप्न सत्यचि वाटलें । दृढ जीवेसीं धरिलें ।।
अवघा मायिक विचार । तोचि मानिला साचार ।।
नानि मंदिरें सुंदरे । दिव्यांबरें मनोहरें ।।
जीव सुखें सुखावला । थोर आनंद भासला ।।
रामदास म्हणे मद । लिंगदेहाचा आनंद ।।
'''भावार्थ---'''
माणसाचे मन सतत कल्पनांच्या भरारी घेण्यांत रममाण होत असते ,स्वप्न हेच सत्य समजून तो त्याला घट्ट कवटाळून धरतो . हा सगळा मायेचा खेळ तो खरा आहे असे समजतो.अनेक भव्य,दिव्य ,सुंदर मंदिरें त्याच्या मनाला मोह घालतात ,जीवाला सुखावतात,खूप आनंद देतात.संत रामदास म्हणतात,हा केवळ देहाचा आनंद असून तो नश्वर आहे,स्वप्ना सारखा काल्पनिक आहे.
'''अभंग---242'''
नवस पुरवी तो देव पूजिला ।
लोभालागीं जालां कासाविस
कासाविस जाला प्रपंच करितां ।
सर्वकाळ चिंता प्रपंचाची
प्रपंचाची चिंता करितांचि मेला ।
तो काय देवाला उपकार
उपकार जाला सर्व ज्यां लागोनि ।
ते गेलीं मरोनि पाहतसे
पहातसे पुढें आपणहि मेला ।
देवासि चुकला जन्मवरी
'''भावार्थ---'''
सर्वसामान्यपणे माणुस सतत प्रपंचाची चिंता करीत असतो,प्रपंच्याच्या काळजीने त्याचा जीव कासाविस होतो.त्या मुळे तो देवाला पुजून नवस बोलतो.देव नवसाला पावावा या लोभामुळे काकुळतिला येतो आणि प्रपंचाची चिंता करता करता मरून जातो,शेवटी तो प्रपंचाला व परमार्थाला दोन्हीला पारखा होतो .संत रामदास म्हणतात, प्रपंचाचा लोभ सोडून सर्वभावे देवाची भक्ती करून ,सर्व भाव देवावर सोपवल्यास प्रपंच व परमार्थ दोन्ही साधतां येईल.
'''अभंग---243'''
कर्ता एक देव तेणें केलें सर्व ।
तयापासी गर्व कामा नये ।।
देह हें देवाचें वित्त कुबेराचें ।
तेथें या जीवाचें काय आहे
देता देवविता नेता नेवविता ।
कर्ता करविता जीवा नव्हे ।।
निमित्ताचा धणी केला असे प्राणी ।
पाहतां निर्वाणीं जीव कैचा ।।
लक्षुमी देवाची सर्व सत्ता त्याची ।
त्याविण देवाची उरी नाहीं ।।
दास म्हणे मना सावध असावें ।
दुश्चित नसावे सर्वकाळ ।।
'''भावार्थ---'''
देव सर्व घटनांचा कर्ता असून त्यानेच हा सर्व विश्व पसारा निर्माण केला आहे तेव्हां आपण गर्व करणे योग्य नाही.आपला देह देवाचा असून धनसंपत्ती कुबेराची आहे .देव सारे देणारा, नेणारा आणि करविणारा आहे.मनुष्य प्राणी केवळ निमित्तमात्र आहे .लक्षुमी व सर्व सत्ता देवाची असून देवाशिवाय जीवाचे कांहीं नाही या साठी संत रामदास सांगतात कीं,आपण केव्हांही मनाने खिन्न न होतां सावधचित्त असावें .
'''अभंग---244'''
नको करू अभिमान । होणार तें देवाधीन ।।
बहू द्रव्यानें भुलले । काळें सर्वहि ग्रासिलें ।।
जे जे म्हणती मी शक्त। ते ते जाहले अशक्त ।।
रामदास सांगे वाट । कैसा होईल शेवट ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास सांगतात, भविष्यातील सर्व घटना दैवाधीन आहेत .त्यांचा अभिमान धरु नये .खूप धन संपत्तीने धनिक भुलून जातात परंतू ती नश्वर असल्याने कालांतराने विनाश पावते .जे स्वता:ला शक्तीशाली समजतात ते शक्तीहीन होऊन लयास जातात ,
'''अभंग---245'''
अर्थेविण पाठ कासया करावें ।
व्यर्थ कां मरावें घोकुनियां ।।
घोकुनियां काय वेगीं अर्थ पाहें ।
अर्थरूप राहे होउनियां ।।
होउनियां अर्थ सार्थक करावें ।
रामदास भावें सांगतसे ।।
'''भावार्थ---'''
पसंत रामदास सांगतात ,अभंगातिल शब्दांचे अर्थ समजून न घेतां केवळ घोकून पाठांतर करण्याचे सारे श्रम फुकट जातात .कवनातील अर्थाशी एकरूप होऊन पाठ केले तर त्याचे सार्थक होते ,त्यात सांगितलेला भाव जीवनांत उतरतो आणि जीवाचे कल्याण होते .
'''अभंग---246'''
माजीं बांधावा भोपळा । तैसी बांधू नये शिळा ।।
घेऊं येतें तेंचि घ्यावें । येर अवघेंचि सांडावें ।।
विषयवल्ली अमरवल्ली । अवघीं देवेचि निर्मिली ।।
अवघें सृष्टीचें लगट । करुं नये कीं सगट ।।
अवघें सगट सारिखेंची । वाट मोडली साधनाची ।।
आवघेचि देवे केलें । जें मानेल तेंचि घ्यावें ।।
दास म्हणे हरिजन । धन्य जाणते सज्जन ।।
'''भावार्थ---'''
पाण्यामध्ये पोहतांना भोपळा बांधून पाण्यांत उतरल्यास बुडण्याची भिती नसते ,पण त्या ऐवजी शिळा बांधली तर पोहणारा शिळेसह पाण्यांत बुडून जाणार या साठी ज्या कामासाठी ज्या गोष्टीचा उपयोग करणे योग्य त्यांचाच उपयोग करावा ,अयोग्य गोष्टींचा त्याग करावा.विषवल्ली (जी सेवन केल्यानंतर तात्काळ मृत्यु येतो)व अमरवल्ली ( जिच्यामुळे अमरत्व प्राप्त होते) या दोन्हीही निसर्गनिर्मित आहेत परंतू त्यांचा उपयोग सरसकट करता येत नाही.जे आपल्याला मानवेल तेच स्विकारावे असे सांगून संत रामदास म्हणतात, संत सज्जन धन्य होत ते आपल्या हिताचे असेल ते च करायला सांगतात.
'''अभंग---247'''
त्रैलोक्याचें सार वेदा अगोचर ।
मंथुनी साचार काढियेले ।।
तें हें संतजन सांगती सज्जन ।
अन्यथा वचन मानूं नये ।।
जें या विश्वजनां उपयोगी आलें ।
बहुतांचें जालें समाधान ।।
रामीरामदासीं राघवीं विश्वास ।
तेणें गर्भवास दुरी ठेला ।।
'''भावार्थ---'''
त्रिभुवन(स्वर्ग ,पृथ्वी ,पाताळ ) या तिन्ही भुवनांचे सार जे वेदामध्ये स्पष्ट केले आहे ते संत सामान्य लोकांना सांगतात, आपण ते खोटे आहे असे मानू नये कारण ते ज्ञान विश्वतील अनेक लोकांना उपयोगी आले आहे,त्या मुळे अनेकांचे समाधान झाले आहे.संत रामदास म्हणतात,आपला राघवावर दृढ विश्वास आहे कारण श्री रामाच्या कृपाप्रसादामुळेच आपली जन्म मरणाच्या चक्रातून सुटका झाली .
'''अभंग---248'''
वेधें बोधावें अंतर ।भक्ति घडे तदनंतर ।।
मनासारिखें चालावें । हेत जाणोनि बोलावें ।।
जनी आवडीचे जन । त्याचे होताती सज्जन ।।
बरें परिक्षावें जनां । अवघें सगट पिटावेना ।।
दास म्हणे निवडावे ।लोक जाणोनियां घ्यावे ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास या अभंगात लोकनेत्याने कसे आचरण ठेवावे या विषयी मार्गदर्शन करीत आहेत .अनेक लोकांचे अंतरंग समजून घ्यावे,त्या नंतर लोक भक्तिमार्गाला लागतात.लोकांच्या मनातिल हेतू जाणून बोलावे,त्यांच्या मनाप्रमाणे वागावे.लोकांना प्रिय असलेले नेतेच लोक संत सज्जन म्हणून स्विकारतात.सरसकट सर्व माणसे सारखी नसतात तेव्हां लोकांना समजून घेऊन योग्य माणसांची निवड करावी.
'''अभंग---249'''
एक उपासना धरीं ।भक्ति भावें त्याची करीं ।।
तेणें संशय तुटती । पूर्वगुण पालटती ।।
सर्व नश्वर जाणोन वृत्ति करी उदासीन ।।
सत्य वस्तूच साचार ।त्याचा करावा विचार ।।
त्यागोनियां अनर्गळ । सदा असावें निर्मळ ।।
ध्याने आवरावें मन । आणि इंद्रियदमन ।।
अखंड वाचे रामनाम ।स्नान संध्या नित्यनेम ।।
दास म्हणे सर्वभाव । जेथे भाव तेथें देव ।।
'''भावार्थ---'''
या अभंगात संत रामदास साधकांना मार्गदर्शन करीत आहेत .आपले एक उपास्य दैवत ठरवून भक्तिभावाने त्याची उपासना करावी .त्या मुळे मनातिल सर्व संशयाचे निरसन होते आणि आपले पूर्वगुण पालटतात .केवळ ईश्वर हीच सत्य वस्तू असून बाकी सर्व विनाशी आहे ,याचा विचार करून आपली वृत्ति उदासीन करावी (मोह, माया,राग,लोभ यांचा त्याग करावा .)समाजांत अमान्य असलेल्या (अनर्गळ ) गोष्टींचा त्याग करावा ,मनानें निर्मळ असावे .इंद्रिये ताब्यांत ठेवून ध्यानमार्गाने मनावर ताबा मिळवावा .स्नानसंध्या नित्यनेमाने करावी आणि वाचेने अखंड रामनामाचा जप करावा .जेथें भक्तिभाव तेथे देव असून बाकी सर्व फापट पसारा आहे असे समजून त्याचा त्याग करावा .
'''अभंग---250'''
दु:खे दु:ख वाढत आहे । सुखे सुख वाढत आहे ।।
बय्रानें बरेचि होते । वाईटें वाईट येतें ।।
हटानें हट वळावें । मिळतां मिळणी फावें ।।
सुशब्दे माणुस जोडें । कुशब्दे अंतर मोडें ।।
प्रीतीनें प्रीतीच लागे । विकल्पें अंतर भंगें ।।
सेवके दास्य करावें । राघवें प्रसन्न व्हावें ।।
'''भावार्थ---'''
चांगल्या कर्माचे फळ चांगले मिळते व वाईट कर्माचे फळ वाईट असते हा कर्मफळाचा सनातन सिध्दांत सागून संत रामदास म्हणतात, दु:खानें दु:ख आणि सुख दिल्यानें सुख वाढते .दुष्ट लोकांकडून दुष्टांना वठणीवर आणावें आणि चांगल्या लोकांना सुशब्दांनी आपलेसे करावें .प्रेमळपणे प्रेमळांना जिंकावें .संशयामुळे मने दुखावली जातात म्हणुन मनामध्यें विकल्प नसावा .श्रीरामाचा दास बनून राघवाचे दास्य करावें आणि राघवाने प्रसन्न होऊन कृपा करावी .
'''अभंग---251'''
माता पिता जन स्वजन कांचन ।
प्रियापुत्रीं मन गोवू नको ।।
गोवू नको मन राघवेंवांचोनी ।
लोकलाज जनीं लागलीसे ।।
लागलीसे परी तुवां न धरावी ।
स्वहितें करावी रामभक्ति ।।
रामभक्तिविण होसिल हिंपुटी ।
एकलें शेवटीं जाणें लागे ।।
जाणें लागे अंती बाळा सुलक्षणा ।
ध्याई रामराणा दास म्हणे ।।
'''भावार्थ---'''
आई,वडील,नातेवाईक, सगेसोयरे,प्रिय पत्नी,मुलेबाळे यांच्यामध्यें मन अडकवू नकोस .समाजांत राहातांना लोकमताचा विचार करावा लागतो परंतू त्या गोष्टीचा फार विचार न करतां स्वता:च्या हिताचा विचार करून रामभक्ति करण्यांत आपला वेळ सार्थकी लावावा. आयुष्याच्या शेवटी सर्व सोडून एकट्याला मृत्युला सामोरे जावेंलागते.अंतकाळी एका राघवाचा आसरा लाभतो,तोच जीवन मरणाच्या चक्रातून सोडवणारा आहे. श्री रामाचे सतत स्मरण ठेवून निरंतर रामाचे ध्यान करणे या शिवाय दुसरे सुलक्षण नाही हे समजून घेऊन रामभजनी लागावें असे संत रामदास या अभंगात सांगत आहेत .
'''अभंग---252'''
देव पाषाण भाविला । तोचि अंतरीं दाविला ।।
जैसा भाव असे जेथें । तैसा देव वसे तेथें ।।
दृष्य बांधोनिया गळां । देव जाहला निराळा ।।
दास म्हणे भावातीत । होतां प्रगटे अनंत ।।
'''भावार्थ---'''
पाषाणाची (दगडाची ) मुर्ती करून तोच देव आहे असा भाव अंतरात निर्माण केला तर तीच प्रतिमा मनांत ठसतें.जसा भाव तसाच देव दिसतो.विश्वाचा पसारा निर्माण करून परमेश्वर त्या पासून निराळा झाला .संत रामदास म्हणतात , इंद्रियांना दिसणार्या दृष्य विश्वापासून दूर (भावातीत ) झाल्याशिवाय अनंत परमेश्वराचे दर्शन घडणार नाही .
'''अभंग---253'''
जाला स्वरुपीं निश्चय ।तरि कां वाटतसे भय ।।
ऐसे भ्रमाचे लक्षण । भुले आपणां आपण ।।
क्षण एक निराभास । क्षणें म्हणे मी मनुष्य ।।
रामीरामदास म्हणे । देहबिध्दीचेनि। गुणे ।।
'''भावार्थ---'''
आपण परमेश्वराचा अंश आहोत असा अद्वैत भाव मनामध्यें स्नानिर्माण होऊन अहंम ब्रह्मास्मी असा मनाचा निश्चय होतो,तरी भयाची भावना निर्माण होते कारण आपल्या मूळ स्वरुपाचा आपल्याला विसर पडतो.हेच भ्रमाचे लक्षण आहे .एका क्षणी सर्व संशयाचा निरास होऊन मन नराभास होते,आपल्या स्वरुपाशी एकरूप होते तर दुसऱ्या क्षणी आपण व सत्स्वरुप भिन्न असून ,आपण अविनाशी आत्मतत्व नसून मर्त्य मानव आहोत अशी धारणा होते हे देहबुध्दी मुळे घडते असे संत रामदास म्हणतात.
'''अभंग---254'''
स्नान संध्या टिळेमाळा । पोटी क्रोधाचा उमाळा ।।
ऐसे कैसें रे सोवळें। । शिवतां होतसे ओवळें ।।
नित्य दांडितां हा देहो परि फिटेना संदेहो ।।
बाह्य केली झळफळ । देहबुध्दीचा विटाळ ।।
नित्यनेम खटाटोप ।मनीं विषयाचा जप ।।
रामदासी द्रुढ भाव । तेणेविण सर्व वाव ।।
'''भावार्थ---'''
कपाळावर गंधाचा टिळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा धारण करून रोज नियमाने स्नान संध्या करुनही मनामध्ये कामक्रोधाची भावना असेल तर हा व्यर्थ खटाटोप आहे .देहदंड करून उपासना केली तर मनाची झळफळ शांत होत नसेल तर हा केवळ बाह्य देखावा ठरतो .त्यामुळे सोवळे, ओवळे हे संदेह मिटत नसतील मनातील नाना कामना,वासना नाहिशा होत नसतील तर हा केवळ देहबुध्दीचा विटाळ समजावा.संत रामदास म्हणतात,राम चरणी दृढ विश्वास असल्याशिवाय या सर्व गोष्टी मातीमोलाच्या आहेत .
'''अभंग---255'''
सुडकें होतसे झाडाचें । पटकर होतसे हाडाचें ।।
यांत सोवळें तें कोण । पाहा पाहा विचक्षण ।।
पाहों जातां घरोघर । कथीकेची एक धार ।।
चुडे दांतवले हाडें । पाहा सोंवळें निवाडें ।।
न्यायनीति विवंचना । हिंगावाचुनी चालेना ।।
दास म्हणे रे संतत ।कांहीं पाहों नये अंत ।।
'''भावार्थ---'''
झाडापासून कापसाचे वस्त्र (सुडकें ) मिळते तर हाडापासून रेशमी वस्त्र (पटकर) ,या वर सखोल विचार केला तर समजते कीं, सोवळे कोणते.घरोघर जाऊन पाहिले तर हे लक्ष्यांत येते कीं, सगळीकडे परिस्थिती सारखीच आहे (कढीची धार एकच आहे ) संत रामदास म्हणतात,सोवळे ओवळे ,न्यायनिती यांचा निवाडा हिंगावाचुन चालत नाही म्हणजे जिवनावश्यक गोष्टींशिवाय होत नाही तेव्हा न्याय,निती,सोवळें , ओवळे यांचा सतत विचार करु नये.
'''अभंग---256'''
एक लाभ सीतापती । दुजी संतांची संगती ।।
लाभ नाही यावेगळा ।थोर भक्तीचा जिव्हाळा ।।
हरिकथा निरूपण । सदा श्रवणमनन ।।
दानधर्म आहे सार । दास म्हणे परोपकार ।।
'''भावार्थ---'''
जीवनांत सीतापतीचा (श्रीरामभक्तीचा ) लाभ होणे हा सर्वात मोठा लाभ आहे या शिवाय संतांची संगती लाभणे हा दुसरा महत्त्वाचा लाभ होय .भक्तिचा जिव्हाळा हा सर्वात थोर लाभ आहे असे सांगून संत रामदास म्हणतात कीं,हरिकथेचे सतत श्रवण , मनन आणि निरुपण तसेच दानधर्म आणि परोपकार हे जीवनाचे सार आहे ,
'''अभंग---257'''
पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे ।।
याचें सार्थक करावें ।आपणासी उध्दरावें ।।
बहुत जन्मांचे शेवटीं । नरदेह पुण्यकोटि ।।
रामदास म्हणे आतां । पुढती न लाभे मागुतां ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात कीं, जेव्हां साधकाच्या जीवनांत पाप पुण्याचे माप सारखे होते,समानता घडते तेव्हांच नरदेहाची प्राप्ती होते. पुष्कळ जन्मांचे शेवटी हा योग घडून येतो आणि त्यानंतर परत पुण्कोटी नरदेहाचा लाभ मिळत नाही या साठी मिळालेल्या नरदेहाचे सार्थक करून घ्यावे व आपला उद्धार करून घ्यावा.
'''अभंग---258'''
तीर्था जाती देखोवेखी। तेथे कैसी होतें पाखी ।।
पाप-गेलें पुण्य जालें । कैसे प्रत्ययासी आलें ।।
दोषापासूनि सूटला । प्राणी मुक्त कैसा जाला ।।
म्हणती जाऊ वैकुंठासी । कैसें येते प्रत्ययासी।।
रामदास म्हणे हित । कैसें जाहलें। स्वहित ।।
'''भावार्थ---'''
साधकानें पवित्र तिर्थस्थाने बघण्यासाठी तेथे जाऊन त्याच्या देहमनाची शुध्दता कशी होते , पाप धुऊन जावून पुण्य कसे झाले याचा प्रत्यय (अनुभव )कसा आला,दोषापासून सुटून प्राणी मुक्त कसा झाला हे कसे समजून घ्यावे यानंतर वैकुंठाची प्राप्ती होणार हा विश्वास कसा निर्माण झाला .संत रामदास म्हणतात, केवळ देवावरील अढळ विश्वासामुळें हिताचे स्वहित झालें.
'''अभंग---259'''
मन-कर्णिकेमाझारी ।स्नानसंकल्प निवारी ।।
स्नान केलें अंतरंगा । तेणें पावन जाली गंगा ।।
गुरुपायी शरण प्रेमें । तोचि त्रिवेणीसंगम ।।
रामकृपेचे वाहे जळ। रामदासी कैसा मळ ।।
'''भावार्थ---'''
साधक पवित्र तिर्थस्थानी जाऊन तेथील पावन नदीच्या जलांत (मनकर्णिका)स्नान करण्याचा संकल्प पुर्ण करतो या पुण्याने त्याचे अंतरंग अमल होते.या शुध्द अंतकरणाने साधक आपल्या गुरु चरणांशी प्रेमाने शरणागत होतो.संत रामदास म्हणतात,रामकृपेच्या पवित्र जलांत रामाचे दास अंतरंगाने मलीन राहूच शकणार नाही .कारण हा त्रिवेणी संगम आहे।
'''अभंग---260'''
आत्मारामेविण। रितें । स्थळ नाहीं अनुसरतें ।।
पाहतां मन बुध्दि लोचन । रामेविण न दिसे आन ।।
सवडी नाहीं तीर्थगमना । रामें रुधिलें त्रिभुवन ।।
रामदासी। तीर्थभेटी । तीर्थ राम होउनि उठी ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात , आत्माराम सर्व अणुरेणुमध्ये व्यापून राहिला आहे .असे एकही ठिकाण नाही कीं,तेथे आत्माराम नाही. मन, बुध्दी आणि लोचन यापैकीं कोणत्याही आंतर किंवा बाह्य ज्ञानेंद्रियांनी पाहिले तरी रामाशिवाय अन्य कांही दिसत नाही.रामाने हे त्रिभुवन व्यापून टाकले आहे त्या मुळे तीर्थाटना साठी स्थानच उरले नाही.जेथे जावे तेथे श्री रामच भरून राहिला आहे.
'''अभंग---261'''
परमेष्ठी परब्रह्म। । तोचि माझा आत्माराम। ।।
कैसें केलें संध्यावंदन । सर्वां भूतीं हो नमन ।।
नाहीं आचमनासी ठावो । तेथे नामचि जालें वावो ।।
जेथें हरपले त्रिकाळ । ऐसी संध्येसि साधली वेळ ।।
कळिकाळा तीन चूळ पाणी । रामदास दे सांडुनी ।।
'''भावार्थ---'''
सर्वात श्रेष्ठ असे जे परब्रह्म तोच आपला आत्माराम आहे असे सांगून संत रामदास म्हणतात,संध्यासमयी सुर्याला केलेले वंदन म्हणजे विश्वातील सर्व प्राणिमात्रास केलेले नमन होय.येथे संध्या करतांना आचमनास देखील ठिकाण नाही. ज्या वेळी भूत, भविष्य ,वर्तमान हे तिन्ही काळ एकमेकांत मिसळून जातात अशी संध्याकाळची वेळ साधून कळिकाळाला तीन वेळा पाणी देवून संत रामदास आपली
संध्या करतात.
'''अभंग---262'''
पूर्वोच्चरिते ओंकार । प्रणवबीज श्री रघुवीर ।।
ब्रह्मयज्ञ कैसा पाहें । अवघें ब्रह्मरुप आहे ।।
देवर्षि पितृगण । तृप्ति श्रीरामस्मरण ।।
सव्य अपस्व्य भ्रांति । ब्रह्म नि:संदेह स्थिति ।।
आब्रह्मस्तंभ पर्यंत । राम सबाह्य सदोदित ।।
दासीं ब्रह्मयज्ञ सफळी । संसारासी तिळांजुळी ।।
'''भावार्थ---'''
ॐ काराचे म्हणजे प्रणवाचे मूळबीज श्री रघुवीर असून त्याचा उच्चार मंत्राच्या प्रारंभी केला जातो .अखिल विश्व ब्रह्मरुप असून सतत ब्रह्मयज्ञ चालू असतो.देव, ऋषी ,पितृगण केवळ श्रीरामांच्या नामस्मरणाने प्रसन्न होतात.ब्रह्म हे कोणत्याही संदेहा पलिकडील स्थिति असून मंत्रोपचारा पूर्वी-करावयाचे सव्य, अपसव्य (डावे,उजवे ) हे केवळ उपचार आहेत असे सांगून संत रामदास म्हणतात,श्रीराम या विश्वाला आतून बाहेरुन व्यापून राहिला आहे .संसाराला तिलांजली देऊन संत रामदासांनी हा ब्रह्मयज्ञ सफळ संपूर्ण केला आहे .
'''अभंग---263'''
अनित्याचा भ्रम गेला । शुध्द नित्यनेम केला ।।
नित्यानित्य हा विचार । केला स्वधर्म आचार ।।
देहबुध्दि अनर्गळ । बोधें फिटला विटाळ ।।
रामदासी ज्ञान जालें । आणि स्वधर्म रक्षिलें ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास म्हणतात,रामनाम जपाचा शुध्द नित्यनेम केल्यानंतर मनातील अनित्य (सतत बदलणार्या )नाशवंत गोष्टींचा भ्रम दूर झाला .नित्य,अनित्याचा विचार जावून स्वधर्माचा आचार सुरु झाला ,मी आत्मा नसून देह आहे ही खोटी देहबुध्दी लोप पावून मनाची मलीनता दूर झाली .शुध्द ज्ञानाचा उगम झाला आणि स्वधर्माचे रक्षण झाले .
'''अभंग---264'''
एकादशी नव्हे व्रत । वैकुंठीचा महापंथ ।।
परी रुव्मांगदाऐसा ।व्हावा निश्चय मानसा ।।
एकादशीच्या। उपोषणे । विष्णुलोकीं ठाव घेणें ।।
रामीरामदास म्हणे । काय प्रत्यक्षा प्रमाण ।।
'''भावार्थ---'''
एकादशी हे केवळ एक व्रत नसून वैकुंठाला जाण्याचा तो महान पंथ आहे .रखुमाईपतीला भेटण्याचा मनाचा निश्चय करून एकादशीचे उपोषण करावे आणि विष्णुलोकी निवास करावा. एकादशी उपोषणाचे पुण्य महान आहे. संत रामदास म्हणतात, प्रत्यक्ष दिसणार्या गोष्टींना प्रमाणाची जरुरी नसते .
'''अभंग---265'''
क्षीरापतीची वाटणी । तेथें जाली बहु दाटणी ।
पैस नाहीं राजांगणी। कोणालागी ।।
रंगमाळा नीरांजने । तेथें वस्ती केली मनें ।
दिवस उगवतां सुमनें। कोमाईली ।।
रथ देवाचा ओढिला । यात्रेकरा निरोप जाला ।
पुढें जायाचा गल्बला । ठायीं ठायीं ।।
भक्तजन म्हणती देवा । आतां लोभ असों द्यावा ।
बहु सुकृताचा ठेवा । भक्ति तुझी ।।
दास डोंगरी राहतो । यात्रा देवाची। पाहतो ।
देव भक्तासवें जातों । ध्यानरुपे ।।
'''भावार्थ---'''
या अभंगांत संत रामदास एकांत स्थळी डोंगरावर निवास करुन तेथून देवाची यात्रा पाहून यात्रेचे वर्णन करीत आहेत.यात्रेमध्ये भक्तांची एव्हढी गर्दी दाटली आहे की,कोणाला पाय ठेवायला देखील जागा नाही .पताका,दिव्यांची रोषणाईयांत माणसांची मने रंगून गेली आहेत .दिवसा उमलणार्या फुलांप्रमाणे मने मोहरून आली .देवाचा रथ ओढण्यासाठी निरोप येतांच पुढे जाण्याची एकच गडबड उडाली .भक्तजन देवाची आळवणी करतात की,खूप पुण्याचाठेवा म्हणजेच देवाची भक्ति ,आता भक्तांवर असाच लोभ ठेवावा .ही नितांत भक्ती पाहून देव भुलतो आणि ध्यानमार्गाने
भक्तांच्या मनांत शिरून त्यांच्या बरोबर जातो .
'''अभंग---266'''
गेला प्रपंच हातींचा । लेश नाही परमार्थाचा ।।
दोहींकडें अंतरला । थोरपणें भांबावला ।।
गेली अवचितें निस्पृहता। नाहीं स्वार्थहि पुरता ।।
क्रोधे गेला। संतसंग । लोभें जाहला वोरंग ।।
पूर्ण जाली नाहीं आस । इकडे बुडाला अभ्यास ।।
दास म्हणे क्रोधे केलें । अवघे लाजिरवाणें जालें ।।
'''भावार्थ---'''
ज्या साधकाला प्रपंच सावधपणे करतां येत नाही त्याला परमार्थही साधतां येणार नाही असे सांगून संत रामदास म्हणतात , असा साधक दोन्ही गोष्टींना पारखा होतो.त्याची निस्पृहता (कोणतिही गोष्ट मिळवण्याची ईच्छा) लयाला जाते.पण मनामध्ये स्वार्थ ही नसतो.अहंकाराने क्रोध निर्माण होतो आणि तो सत्संगाला मुकतो.लोभामुळे रंगाचा बेरंग होतो.त्या साधकाच्या आशा,आकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही,निराशेमुळे साधनेमध्यें खंड पडतो.प्रपंच आणि परमार्थ दोन्ही बुडतो, त्याचे जीवन लाजिरवाणे होते.
'''अभंग---267'''
थोर अंतरी भडका । आला क्रोधाचा कडका ।।
नित्य निरूपणी बैसे । अवगुण जैसे तैसे ।।
लोभें भांबावले मन । रुक्यासाठी। वेंची प्राण ।।
दंभ विषयीं वाढला । पोटीं कामें खवळला ।।
मदमत्सराचा कांटा । अहंकारें धरीं ताठा ।।
दास म्हणे जालें काय । श्रोती। राग मानू नये ।।
'''भावार्थ---'''
मनामध्यें क्रोध शिरला की, अंतकरणांत रागाचा अग्नी भडकतो ,मग कथा निरुपणाला बसला तरी त्या पासून काहीं बोध मिळत नाही आणि अवगुण सरत नाहीत ,त्यांत मनांत लोभ शिरला तर रुपयासाठी प्राण देखिल देण्यास तयार होतो.त्यातच दंभ वाढीस लागतो अनेक प्रकारच्या कामना निर्माण होतात.या कामनांमुळे अहंकार (गर्विष्ठपणा) वाढून अनेकांचा द्वेष ,मत्सर करु लागतो ,संत रामदास म्हणतात, काम, क्रोध,लोभ, मद, मत्सर, दंभ, हे सहा साधकाचे शत्रु आहेत असे समजावें ,या कथनाचा राग मानू नये ,
'''अभंग---268'''
हो कां मुमुक्षु अथवा मुक्त । आहे विषयांचा आसक्त ।।
विवेकवैराग्यसंग्रह ।करणें लागे यावद्देह ।।
रामीरामदास म्हणें । शांति ज्याच्या दृढपणें ।।
'''भावार्थ---'''
मोक्षाची ईच्छा करणारा साधक असो किंवा मुक्त साधक असो तो इंद्रियजन्य विषयांत आसक्त होण्याची शक्यता असते.यासाठी जो पर्यंत देहांत जीव आहे तो पर्यंत विवेक
आणि वैराग्य या साठी प्रयत्न करणे जरुर आहे असे सांगून संत रामदास म्हणतात,विवेक आणि वैराग्य ज्यांच्या मनांत पूर्णपणे रुजला आहे तेथे मनःशांती द्रुढपणे विराजमान असते.
'''अभंग---269'''
वृध्द ते म्हणती संसार करावा ।
जनाहातीं घ्यावा म्हणुनी बरें ।।
म्हणताती जन बरें ते कोणाला ।
बुडविती त्याला ऐशा बोधी ।।
वैश्वदेव दान अतिथी तो घडें ।
टाकी एकीकडे केले दोष ।।
मूर्ख तो म्हणाला काय जी वाल्मिक ।
टाकितां सकळिक मुक्त जाला ।।
रामदास म्हणे कथिलें। जे वेदीं ।
तया मात्र बंदी इतर थोर ।।
'''भावार्थ---'''
काहीं वृध्द अनुभवी लोक म्हणतात की,संसाराचा त्याग करु नये कारण त्यांमुळे जनसंपर्क वाढतो,वैश्वदेव व दानधर्म घडून पुण्यसंचय घडतो तसेच अतिथींचा आदरसत्कार करण्याची संधी मिळते त्यामुळे सर्व दोषांचे निराकरण होते.या वर उत्तरा दाखल संत रामदास विचारतात, सर्वस्वाचा त्याग करून मुक्ती मिळवणारा वाल्मिकी ऋषींना मूर्ख कसे ठरवतां येईल? वेदांनी जे सांगितलें आहे ते प्रमाण मानून थोर लोक वेदांना वंदन करतात.
'''अभंग---270'''
सर्वस्व बुडती ऐसी जे मातोक्ती।
न धरावी चित्तीं साधकांनी ।।
भरत तो मूर्ख काय होतां सांग।
मातेचा तो त्याग। केला जेणें ।।
पित्याने त्यागिलें। दैत्येद्रें प्रल्हादें ।
कां त्यासी गोविंदें स्नेह केला ।।
दैत्य बिभीषणें टाकीयेला बंधु ।
रामासी संबंधु। जोडियेला ।।
रामदास म्हणे। शुक्र होतां गुरू ।
परंतु दातारु। धन्य। बळी ।।
'''भावार्थ---'''
संसाराचा त्याग करून परमार्थाला लागलेल्या साधकांचे सर्वस्व बुडते असे मानणाऱ्या लोकांना संत रामदास सांगतात की,साधकांनी असा विचार करणे योग्य नाही.श्री रामाच्या भक्तीसाठी भरताने आपल्या मातेचा त्याग केला. पित्याने त्याग केलेल्या भक्त प्रल्हादाने गोविंदासी स्नेह जोडला,रावणाचा बंधु बिभिषण याने रावणाचा त्याग करून रामाशी संबध जोडला,शुक्राच्यार्या सारखे गुरु असतांना बळीने वामनाला तीनपाद भूमी दान करून श्रेष्ठ दाता ठरला.हे सर्व भक्त धन्य होत.
'''अभंग---271'''
अनन्याचे पाळी लळे । पायीं ब्रीदावळी रुळे ।।
महामृदगलाचें प्रमें । रणछोडी आला राम ।।
तारी तुकयाचचे पुस्तक । देव ब्रह्मांनायक ।।
कृष्णातीरीं हाका मारी । दासा भेटी द्या अंतरीं।।
'''भावार्थ---'''
संत रामदास या अभंगात म्हणतात कीं, हा ब्रंमांडनायक देव अनन्य भक्ती करणार्या भक्तांचे अनेक हट्ट पुरवतो. त्याने पायांत ब्रीदाचे तोडर बांधले आहे,तुकारामांचे इंद्रायणीत बुडवलेलें अभंग या देवाने जसेच्यातसे वर काढलें.प्रेमळ भक्तांच्या हाकेला धावून जाणार्या देवाला संत रामदास कृष्णातिरी उभे राहून भेट देण्यासाठी आळवित आहेत.
[[वर्ग:संत रामदास]]
nl5hp9vw068ixyw8wtrybomhgiwtp1j
पसायदान(संत ज्ञानेश्वर)
0
3141
13164
7171
2022-08-20T14:39:22Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:संत ज्ञानेश्वर]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
'''संत ज्ञानेश्वर--पसायदान'''
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा मनोज्ञ संगम आहे. तत्वज्ञानाचे रहस्य मधुर काव्यरचनेतून उलगडून दाखवले आहे.आपल्या वैदिक तत्वज्ञानामध्ये उपनिषदे(श्रुतिप्रस्थान)ब्रह्मसूत्र(न्यायप्रस्थान)भगवद्गीता(स्मार्तप्रस्थान) अशी प्रस्थानत्रयी आहे.प्रस्थान म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे म्हणजे प्रेयसाकडून श्रेयसाकडे,प्रवृत्तीकडून निव्रुत्तीकडे हा जीवनाचा प्रवास आहे. आत्मोन्नती हे साध्य व प्रस्थानत्रयी हे साधन आहे.उपनिषदे संस्कृत मध्ये असून त्यातील तत्वज्ञान अभ्यासाला अवघड आहे.भगवद्गीतेत ते सुलभपणे सांगितले आहे आणि ज्ञानेश्वरांनी तर ते अनेक उपमा,दृष्टांत यांचा उपयोग करून सुलभ मराठी भाषेत आणले आहे. हे तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे असामान्य कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.मह्राठियेचिये नगरी।.ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।ही ज्ञानेश्वरी मागील उदात्त बैठक आहे. ज्ञानेश्वरांनी ग्रंथरुपी यज्ञ सिध्दीस नेला.हा यज्ञ सात्विक यज्ञ आहे कारण तो करणे हे कर्तव्य आहे असे मानून फलाची अपेक्षा न ठेवता केला गेला आहे,त्या साठी आवश्यक असे तप केले आहे.या तपश्चर्येतून हा वाक्-यज्ञ सफल झाला व त्यातून ‘ज्ञानेश्वरी’नावाचे अमृत निघाले .आतां या विश्वात्मक देवाने तोषून (आनंदित होऊन) संतुष्ट अंत:करणाने पसायदान द्यावे अशी प्रार्थाना केली आहे. संताचे हे पसायदान व्यत्त्तिगत हितासाठी नसते तर अखिल सजीवस्रुष्टीच्या कल्याणासाठी या शुभकामना
असतात.”जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा”
अशी ती विश्वव्यापी प्रार्थना असते.ज्या वेळी कोणताही यज्ञ सिध्दीस जातो त्या वेळी वैदिक संस्कृती प्रमाणे पसायदान म्हणजे कृपाप्रसाद मागण्यात येतो.ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा वाङ्मयरुपी यज्ञ सिध्दीला नेल्यानंतर जसे पसायदान मागितले तसा संत नामदेवांनी “आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा । माझिया सकळां हरिच्या दासां ।।” असा क्रुपाप्रसाद मागितला.संत तुकाराम म्हणतात,”हें चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा “.समर्थ रामदासांनी श्रीरामाजवळ मागितलेलें पसायदान असे आहे “कल्याण करी देवराया।जनहित विवरी ।। तळमळ तळमळ होत चि आहे। हे जन हाति धरी ।। संत ज्ञानेश्वरांनी मागितलेलें पसायदान म्हणजे संत वाङमयातील झगझगीत कौस्तुभमणी आहे.
'''आतां विश्वात्मके देवे । येणें वाग्यज्ञे तोषावें ।'''
'''तोषुनि मज द्यावें । पसायदान हें ।।'''
ज्ञानेश्वरांनी ज्या विश्वात्मक देवाकडे प्रसाद मागितला आहे तो देव कोणता? या प्रश्नाचे उत्तर ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्ययात दिले आहे. “आतां विश्वात्मकु हा माझा स्वामी निवृतिराजा “आत्मज्ञानाने परिपूर्ण असलेला अतिशय विद्वान महापुरुष निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे सद्गुरु आहेत तोच विश्वात्मकु देवु आहे असे ज्ञानदेव म्हणातात.त्यांनी या या यज्ञाने संतुष्ट होऊन आपणास पसायदान द्यावे ही ज्ञानेश्वरांची पहिली प्रार्थना !
निष्कामता,दृढ आत्मबुध्दी, शुध्दज्ञान,समाधान, उदासिन, कामनारहित वृत्ती, सारासार विचार, निर्मळ आचार,अखंड स्वरुपाकारता,ही दासबोधात वर्णिलेली सद्गुरीची मुख्य लक्षणें ज्याच्या ठिकाणी सर्वार्थाने वसत आहेत अशा निव्रुत्तीनाथ यांच्याकडे संत ज्ञानेश्वर पसायदानांत दुसरी मागणी करीत आहेत.
'''जे खळांची व्यंकटी सांडो।तया सत्कर्मी रती वाढो
'''भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचे ।।''''''
या ओवीमध्ये तीन गोष्टी मागितल्या आहेत खळ म्हणजे दुष्ट. व्यंकटी म्हणजे कुटिलपणा. जेवढे वाईट आचरण आहे वाकडेपणा आहे त्याला व्यंकटी म्हणायचे खळांच्या म्हणजे दुष्टांच्या अंतःकरणामधील कुटिलपणा जावो ही पहिली मागणी आहे. कुटिलपणा गेल्यानंतर तया सत्कर्मी रती वाढावी, सत्कर्मे त्यांच्या हातून घडावीत आणि त्यामध्ये त्यांना गोडी निर्माण व्हावी असे दुसरे मागणे मागितले अवघ्या प्राणिमात्रांची परस्परांशी मैत्री व्हावी आणि त्यामुळे अवघ्या प्राणिमात्रांचे कल्याण व्हावे अशा तीन गोष्टी या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वरांनी मागितल्या आहेत.संत ज्ञानेश्वर हे कारक पुरुष आहेत,अवतारी पुरुष
नाही.संस्कृतमधील कारक या शब्दाचा अर्थ आहे तप,अत्यंत सात्विक तप करणारा महापुरुष म्हणजे कारकपुरुष तपाने माणुस शुध्द,सात्विक होत जातो.सद्गुरु निवृत्ति नाथांच्या आदेशा प्रमाणे अज्ञानी लोकांना ज्ञानमार्गाकडेनेण्यासाठी,जनसामान्यांना भक्तिमार्गाची शिकवण देण्यासाठी,धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी ज्ञानेश्वरी
लिहीली आहे. समाजातला सात्विकपणा हे कारक पुरुष जपत असतात.त्यामुळे सज्जनांचे परित्राण होते पण दुष्टांचे हनन करता येत नाही.व्यास,वाल्मिकि ,शंकराचार्य हे कारक पुरूष होऊन गेले .कारकपुरूष उत्तमातले उत्तम या मातीत रुजावे या साठी सतत प्रयत्न करतात.ज्ञानेश्वरां सारखे संत हेच कार्य करतात.समाजांत खल निर्माण होण्याची तीन कारणे आहेत.
चांगले संस्कार न लाभणे,कर्माचे कर्तुत्व स्वत:कडे घेणे ,तीव्र वासनांचे दमन न करता येण.आतां या दुष्टांचे हनन तर संतांना करता येत नाही पण त्यांचा दुष्टपणा कमी करता येतो.बुध्दीला इच्छेची जोड न देता बोधाची जोड देवून दुष्टांचे परिवर्तन संत करतात.चांगले करणे(कृत) चांगले करविणे,(कारित)चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देणे (अनुमोदित) या प्रकारे संत हे कार्य करीत असतात.त्यामुळे
सामान्य लोकांमध्ये सत्कर्मांची आवड निर्माण होते.जे कर्म आपल्या वाट्याला आले ते पार पाडणे म्हणजेच सत्कर्मामधली गोडी वाढवणे अशी गोडी जेव्हां वाढीस लागते तेव्हां खळांची व्यंकटी कमी होत जाते.अहंकार कमी होतो,इच्छा कमी व्हायला लागतात,सुसंस्काराचे महत्त्व पटू लागते.सत्कर्माची गोडी वाढत असतांना परस्परांतील मैत्री वाढत जाते.मनुष्य भक्तीने,आत्मज्ञानाने विनयशील बनतो,सहनशील होताना मनाने व्यापक बनत जातो.मत्सर,द्वेष लयाला जातात.सगळ्यांची एकमेकांशी निर्व्याज मैत्री व्हावी
अशी ज्ञानदेवांची इच्छा आहे,हेच पसायदानांत त्यानी मागितले आहे.या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी सद्गुरु चरणीं मागणे मागितले आहे ते असे-
'''दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।'''
. '''जो जे वांछील तो ते लाहो ।प्रणिजात ।।'''
येथेही ज्ञानेश्वरांच्या तीन मागण्या आहेत.दुरित म्हणजे पापतिमिर म्हणजे अंधार!पापरुपी अंधार नाहिसा होऊ दे ही पहिली प्रार्थना.आता तिमिर जाण्यासाठी सूर्योदय झाला पाहिजे.ज्ञानेश्वरांना जो सूर्य अभिप्रेत आहे तो स्वधर्मरुपी सूर्य आहे.तो उदयाला येवो अशी दुसरी विनंती आहे.तिसरी मागणी विश्वातील सर्व प्राणिजाता साठी आहे.जो जे वांछील म्हणजे ईच्छा करील ती वस्तू किंवा गोष्ट त्याला प्राप्त होवो अशा या तीन अलौकिक मागण्या आहेत की ज्या मुळे हे पसायदान वैश्विक पातळीवर पोचले आहे.दुरित या शब्दाचा अर्थ आहे असत्य!याचा विरुध्द
शब्द आहे ऋत. ऋत म्हणजे वैश्विक सत्य.ज्यामुळे अवघ्या विश्वाची धारणा होते असे विश्वात्मक नियम.हे नियम नुसत्या बुध्दीने धारण करता येत नाहीत,त्या साठी प्रज्ञेची
जरुरी असते आणि बुध्दीला बोधाची जोड मिळाली तरच प्रज्ञा निर्माण होते.दुरितांचे तिमिर जावो कारण जिथे तिमिर आहे तेथे अविद्या व पाप आहे.जेथे ऋत आहे तेथे ज्ञान व पुण्य आहे.दुरित जर घालवायचे असेल तर ऋताची कल्पना मनांत ठसली पाहिजे,आणि ती ऋतंभरा प्रज्ञेवर अधिष्ठित झाली पाहिजे.
ज्ञानेश्वर म्हणतात की,’दुरितांचे तिमिर जायला हवे असेल तर विश्वांत स्वधर्मरुपी सूर्याचा उदय व्हायला पाहिजे.स्वधर्म आणि सत्कर्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.स्वधर्म आचरला तरच त्याला सत्कर्म म्हणता येईल.व्यत्तिगत स्वार्थासाठी केलेले कर्म ते दुष्कर्म.लोककल्यासाठी केलेले कर्म स्वधर्माचे पालन करणारे आहे
म्हणुनच ते सत्कर्म होय.
'''‘जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात’।।'''
स्वधर्मसूर्याचा प्रकाश पसरावा म्हणुन आपण स्वधर्माचे आचरण केले पाहिजे त्यामुळे आपल्या सर्व इच्छा आपोआपपूर्ण होतील.स्वधर्म कामधेनूप्रमाणे इच्छापूर्ती करणारा आहे,कारण त्याला बैठक स्वकर्माची आणि स्वधर्माची असणारआहे.या स्वधर्मासाठी सगळ्यांना प्रवृत्त कसे करायचे या प्रश्नाचे ऊत्तर ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत दिले आहे.
'''वर्षत सकळ मंगळीं ।ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।'''
'''अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ।।''''''
संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करणारी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सर्व प्राणिमात्रांना अनवरत म्हणजे निरंतर भेटत राहो असे मागणे मागितले आहे.ज्ञानेश्वर म्हणतात,जे ईश्वरनिष्ठ आहेत त्यांची मांदियाळी म्हणजे समुदाय एकत्र येऊन सर्व प्राणिमात्रांवर संपूर्ण कल्याणाचा वर्षाव करु दे।.तो वर्षाव झाला की,माणसे स्वकर्माला कधीही चुकणार नाहीत.समुदायातील सर्व माणसे सारख्या पात्रतेची नसतात.बध्द,मुमुक्ष,साधक,सिध्द अशा विविध पातळीवरची असतात.बध्दापासून सिध्दापर्यंतचा प्रवास सुकर होण्यासाठी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सतत निरंतर,अखंड भेटत राहिली पाहिजे आणि त्यांनी संपूर्ण ,काहिही राखून न ठेवतां कल्याणाचा वर्षाव केला पाहिजे तरच परमार्थाचा मार्गसापडू शकेल.ईश्वरनिष्ठा निर्माण होण्यासाठी आधी ईश्वर कसा आहे हे समजून घेतले पाहिजे.मंदिरामध्ये सजवून ठेवलेली
मूर्ती किंवा घरातील धातुची अगर पाषाणाची मूर्ती संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नाही. ईश्वर हा स्वयंभू आहे स्वत:च्या निरपेक्ष आनंदासाठी तो प्रकट होतो.दुसरी खूण अशी की,तो कर्ता असूनही अकर्ताआहे.माणसाच्या बुध्दीला तो अगम्य आहे.तो अमूर्त असूनही मूर्त होतो.आतां ईश्वराचे स्वरुप समजल्यावर त्याच्यावर निष्ठा निर्माण होते.असे ईश्वरनिष्ठ आत्मज्ञानी असतात.त्यांच्या हातात विवेकाचा चाबूक असतो.ते आमची देहबुध्दी नाहिशी करतात.ते अविवेकाचा अंधार दूर करतात तेथे विवेकाचा लखलखीत दिवा लावतात.ते अनवरत म्हणजेअखंड,निरंतर भेटत राहावेत.कारण त्या शिवाय स्वाध्याय होणार नाही.सातत्य राहणार नाही.अशी सदिच्छा संतं ज्ञार्नेश्वरांनी व्यक्त केली आहे.
हे भक्तीचे अमृत वाटत नघालेले ईश्वरनिष्ठ कसे आहेत याचे वर्णन संत ज्ञानदेव पुढील ओवीत करीत आहेत.
'''‘ चलां कल्पतरुंचे आरव । चेतनाचिंतामणींचे गाव .'''
'''बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।''''''
ह्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीला संत ज्ञानेश्वरांनी सुरेख उत्प्रेक्षा अलंकाराने सजवले आहे.हा ईश्वरनिष्ठांचा समुदायनसून जणू काही नाना वृक्षवेलींनी,फुलाफळांनी बहरलेले सुंदर उपवन (आरव) आहे. हे आरव असामान्य आहे हे इच्छिले फळ देणाय्रा कल्पवृक्षांनी व्यापलेले आहे.आणि हे कल्पतरु (ईश्वरनिष्ठ संताची मांदियाळी ) अलौकिक आहेत कारण ते एका ठिकाणि स्थिर राहाणारे नसून चल म्हणज (चालते,बोलते ) कल्पतरू आहेत.
या संत समुदाया साठी संत ज्ञानेश्वर दुसरी अप्रतिम उत्प्रेक्षा वापरतात. ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी नसून जणू काही चिंतामणीचे गाव च आहे चिंतामणी मनातिल ईच्छा पूर्ण करणारा काल्पनिक ,अचेतन मणी असतो पण संतरुपी चिंतामणी सचेतन असून जनकल्याणा साठीं भक्तीचे अमृत कुंभ घेऊन अमृत वाटत निघाले आहेत.ह्या ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळी साठी संत ज्ञानेश्वरांनी आणखी एक अनन्यसाधारण उत्प्रेक्षा वापरली आहे.ते म्हणतात,हा संत समुदाय नसून अर्णव म्हणजे सागर आहेत.पण हा अर्णव खाय्रा पाण्याचा किंवा दुधाचा सागर नसून अमृताचा महासागर आहे.विशेष म्हणजे हा सागर सचेतन असून जनसामान्यांच्या कल्याणा साठी त्यांना भक्तिरुपी अमृताचे (पीयुषाचे) पान घडवतात.आतां हे संत असतात कसे?त्यांना ओळखावे कसे?या साठी संत ज्ञानेश्वरांनी या संतांची काही लक्षणे सांगितली आहेत. असे संत चंद्र आणि सूर्यापेक्षाही श्रेष्ठ आहेत असे वर्णन संत ज्ञानेश्वर करतात.
'''चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।'''
'''ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।'''
पौर्णिमेचा पूर्ण चंद्र जरी बघितला तरी त्याच्यावर डाग आहे.पण ईश्वरनिष्ठ संत निष्कलंक असतात.मार्तंड म्हणजे सूर्य तेजाचा झगझगीत अग्नीगोल,तो तापहीन असूच शकत नाही.पण संत हे ज्ञानरुपी मार्तंड आहेत.त्याचे तेज दाहक नसून शीतल आहे.ते ज्ञानाचा प्रकाश देऊन अविद्येचा नाश करतात पण अगदी सौम्यपणे.पूर्ण चंद्राच्या शीतल चांदण्यांचा ते वर्षाव करतात.संतांच्या ठिकाणी चंद्राचा कलंक नाही आणि सूर्याची दाहकताही नाही.सूर्याला उदय अस्त आहे,चंद्राला क्षय आहे पण ईश्वरनिष्ठ संत सदा सारखेच आहेत.त्यांना डावे-उजवे,कमी-ज्यास्त,अशी कसलिही उणीव नाही ते सदा परिपूर्णच आहेत.ते आपल्या ठिकाणीच रममाण झाले आहेत.ते आनंदाचे प्रतिबिंब किंवा सुखाचे कोंभ आहेत. ते विवेकाचे मूळ वसतिस्थान आहेत.
किंवा ब्रह्मविद्येचे अवयवच आहेत . (ज्ञानेश्वरी )आत्मप्रचितीचा ,,ब्रह्मसाक्षात्काराचा ,आत्मानुभावाचा अर्थ संतांच्या सहवासात उलगडतो.म्हणून संत ज्ञानेश्वर सांगतात की ते संत सज्जन तुमचे सोयरे होऊ देत आणि तुम्हाला सर्व सुखाचा लाभ होऊ दे.असे लोकोत्तर संत सामान्य जनांना प्रपंच्याच्या विळख्यातून बाहेर काढतात,त्यांची दु:खे पूर्णत:नाहीशी करतात.असे संत आपले सोयरे झाले तर मग काय होईल हे ज्ञानेश्वर पुढिल ओवीत सांगत आहेत.
'''किंबहुना सर्वसुखी । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं'''
'''भजिजो आदिपुरखीं । अखंडित ।।'''
ज्याच्या चित्तांत निरंतर समाधान ,शांती असते त्यांना संत म्हणावे.ही शांती कोणत्याही बाह्य गोष्टींवर ,वस्तूंवर,चित्ताच्या लहरीवर ,प्रवृतींवर अवलंबून नसते.ज्ञानयोगात जशी ज्ञाता ज्ञान,ज्ञेय अशी त्रिपुटी असते तशी ती कर्मयोगात,ध्यानयोगात,व भक्तियोगामधे आहे.ही त्रिपुटी जिंकल्याशिवाय चिरशांती प्राप्त होत नाही.संतांनी ही त्रिपुटी सांडलेली असते.ज्ञानेश्वर म्हणतात एवढे पसायदान
गुरूकडे मागून झाले.आणि मग म्हणतात,किंबहुना म्हणजे फार काय सांगावे तर त्रैलोक्य सर्व सुखाने पूर्ण होऊन त्याने आदिपुरुषाचीअखंडित उपासना करावी,भजन करावे.ज्ञानेश्वर हे विश्वमानव आहेत.त्यांचे मागणेही अत्यंत व्यापक स्वरुपाचे आहे.ते जे दान मागत आहेत ते केवळ पृथ्वीवरील मानवासाठी नाही तर स्वर्ग,पृथ्वी,पाताळ या वरील देव,मानव,दानव या सर्वांसाठी आहे.तिन्ही लोकं परिपूर्णहोऊन आदिपुरुषाला शरण जावो,त्याची अखंडित पूजा करो असे हे विश्वव्यापी मागणे आहे.या ओवीत संत ज्ञानेश्वरांनी सर्वसुखी हा अगदी समर्पक शब्द वापरला आहे .आपल्या व संतांच्या सुखाच्या
कल्पना वेगवेगळ्या आहेत.आमची सुखे मर्यादित असतात तर संतांचे सुख विश्वात्मक असते कारण ते आत्मतत्वाचे
असते.आपले सुख इंद्रियजनित ,कनिष्ठ असते कारण ते क्षणभंगूर असते.
ज्ञानेश्वरीच्या 18व्या आध्यायांत ज्ञानेश्वरांनी सुखाची व्याख्या केली आहे.”जीवाला आत्म्याच्या संबंधातून जे प्राप्त होते, म्हणजे जीवात्मा परमात्मा झाल्यानंतर त्याला जी अनुभूती येते त्याला सुख म्हणायचे.आतां हा आदिपुरुष कोण आहे,ईशतत्व कोणतेआहे याचे ही उत्तर संतांनी दिलेआहे.आपण अनेक देवदेवतांचे गणपती,देवी,राम,कृष्ण,ब्रह्मा,विष्णु,महेश पूजन करीत असतो पण प्रत्येकाला झालेली अनुभूती एकाच चैतन्यतत्वाची असते.सगुणाची उपासना करतांना हळूहळ शुध्द होऊन निर्गुणाकडे जाता येते.म्हणून ‘येक नाना प्रतिमा’,येक अवतार महिमा,येक अंतरात्मा,आणि चौथा जो परमात्मा आहे तो वेगळा.पदार्थ!,वस्तु नाशवंत असतात परमात्मा अविनाशी आहे.त्या आदिपुरुषाची पूजा मांडायची आहे ती सात्विक सुखाची आहे,तामस किंवा राजस नाही.निद्रा,आळस आणि प्रमाद
यांच्यावर आधारलेले सुख सन्मार्ग दाखवू शकत नाही तर सात्विक सुख जे प्रारंभी विषासारखे,परिणामी अमृतामध्ये बदलणारे आहे ते सन्मार्गदर्शक असते.(भगवद्गीता)
आपल्याला आदिपुरुषाचे भजन केव्हा करता येईल असा प्रश्न निर्माण होतो.अनासक्त कर्मयोग जो आचरतो,ज्याला आत्मज्ञान झाले त्याला आदिपुरुषाचे भजन सहज मांडता येईल.अशा असामान्य संतांना समाजमान्यता मिळण्यास वेळ लागत नाही.मानव देह प्राप्त झाल्यावर आत्मोनतिचा प्रयत्न करावा असे संत सांगतात व त्या साठी त्यांनी नवविधा भक्तिचा मार्ग सुचवला आहे.त्यातही श्रवणभक्तिला प्रधान स्थान देण्यात आले आहे.धार्मिक ग्रथांचे श्रवण,वाचन किंवा त्यांचा अभ्यास म्हणजे श्रवण भक्ती की ज्यामुळे उत्तम संस्कार चित्तावर उमटतील.व त्यातले ज्ञान आत्मसात होऊन आत्मोनतीचे दरवाजे खुले होतील.म्हणुन संत ज्ञानेश्वर म्हणतात--
'''“ आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकीं इयें ।'''
'''दृष्टादृष्टविजयें । होआवें जी ।।”'''
‘ग्रंथोपजीविये’म्हणजे ग्रंथ हेच तुमचे जीवन होऊन जावो.किंवा तुमचे जीवन ग्रंथरुप होऊन जावो.ग्रंथामध्ये वर्णिलेला आत्मसाक्षात्कार प्रत्यक्ष अनुभवास येवो.अशा असामान्य ग्रथांची व्याख्या समर्थ रामदासांनी केली आहे
'''जेणे परमार्थ वाढे ।अंगी अनुताप चढे ।आणि भक्तिसाधन आवडे । त्या नाव ग्रंथ ।'''
ज्य मुळे धैर्य वाढते,निश्चय बळावतो,परोपकार घडतो,सर्व शंकांचे निरसन होते,बुध्दी निश्चयात्मक बनते त्याला ग्रंथ म्हणायचे.अद्वैतापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा ग्रंथ नाहीअसे अनेक जाणकारांणचे मत आहे.ज्याच्या योगाने विरक्ती व भक्ति उत्पन्न होत नाही,जो मोक्षलाभ देत नाही तो ग्रंथच नव्हे.अवगुणांचे रूपांतर सद्गुणांमध्ये करुन माणसाची अधोगती टाळली जाते,हे ज्याच्या श्रवण ,अध्ययनाने घडते तो खरा ग्रंथ.त्याचे वाचन केले तर परमेश्वराचा निदिध्यास लागतो. तो आदिपुरुष कोण व तो कसा आहे हे हळूहळू समजते.अद्वैतामध्ये भक्तीचे जे अंग आहे ते प्राप्त करुन घ्या असे संत ज्ञनेश्वर सांगतात,म्हणुन ग्रंथोपजीविये होतांना कर्म ही पहिली पायरी आहे.नंतर भक्ती व ज्ञान आहेत.
या मृत्युलोकामधे जो मनुष्यदेह लाभलेला आहे तो अत्यंत क्षणभंगूर आहे पण तो आत्मोन्नतीसाठी दिला आहे याची जाणिव ठेवून जो ग्रंथाचे अध्ययन करतो,तो दृष्ट व अदृष्ट दोन्हीवर विजयी होतो.दृष्ट म्हणजे जे प्राप्त झाले ते,आणि अदृष्ट म्हणजे जे प्राप्त व्हायचे ते.आपल्या वाटेला आलेले भोग किंवा-सुखदु:ख त्याला म्हणतात दृष्ट.अदृष्ट म्हणजे आपले संचित जे केव्हातरी आपल्यापुढे प्रकट होणार आहे,म्हणून ते अदृष्ट.आपले संचित म्हणजे पूर्वकर्म साठलेले आहे ते प्रारब्ध होऊन उभे राहाणार आहे.त्यालासामोरे जाण्यासिठी क्रियमाण,चांगले करून संचित निर्माण
करायला हवे की जे शुभ संचित असेल.क्रियमाण कर्मातूनसंचित निर्माण करण्याचे आपल्याला स्वातंत्र्य आहे.या इहलोकी,ज्याला मर्त्यलोक असे संबोधण्यात येते येथे आपला देह क्षणभंगूर आहे,याचे भान ठेवून हा ग्रंथच (ज्ञानेश्वरी) आपले जीवन बनवण्याचा व दृष्ट- अदृष्टावरविजय प्राप्त करण्याचा मनोदय केला पाहिजे.या प्रयत्नात आपल्याला यश द्यावे अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर सद्गुरुंच्या चरणी करीत आहेत.सगळ्या मानवांची प्रकृती हळूहळू संस्कृतीकडे वळावी.लोककल्याणाचा मार्ग त्यांना दिसावा म्हणून संतज्ञानेश्वरांनी हे विश्वव्यापी ,विलक्षण मागणे मागितले आहे.प्रवृत्तिकडून निवृत्तिकडे जाणारा खरा धर्म येथे सुफल झालाआहे.आत्मज्ञानाचा हा कृपाप्रसाद सर्वांना लाभेल असे निवृत्तिनाथ संतुष्ट होऊन म्हणाले.
'''येथ म्हणे श्रीविश्वेशरावो ।हा होईल दानपसावो ।'''
'''येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।'''
हा विश्वाचा राव कोण आहे?जो प्रत्यक्ष आदिपुरूष सद्गुरु निवृत्तिनाथांच्या रुपाने प्रकटला आहे.तो विश्वेश्वर संतुष्ट झाला आणि तथास्तु म्हणाला.’हा होईल दानपसावो।’हे दान असे आहे की,देणार्याला जास्त सुख व घेणार्याला कमी सुख देणारे आहे.तो कृपाप्रसाद सर्वांना लाभेल असे वरदान सद्गुरुंकडून मिळाले त्यामुळे ज्ञानेश्वरांना अतीव सुख झाले.
खळांची व्यंकटी सांडेल,सत्कर्मी रती वाढेल ,सर्व प्राणिमात्रांची परस्परांशी मैत्री होईल.अज्ञानाचा ,पापाचा अंध्:कार नाहिसा होईल,विश्वात स्वधर्मरुपी सूर्य उदयाला येईल,प्राणिमात्रांच्या मनातिल सर्व इच्छा संपूर्ण होतील,ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या भूतलावर प्रकट होईल,सर्वांना आत्मकल्याणाचा मार्ग सुकर होईल.जे साक्षात् कल्पतरुंची वने आहेत,चेतना चिंतामणींची गावे आहेत,अमृताचे महासागर आहेत,येथील संत सज्जन सूर्यासारखे तेजस्वी असूनही दाहक नाहीत,चंद्रासारखे शीतल असूनही निष्कलंक आहेत.हे सगळे प्राप्त होईल असा कृपाप्रसाद सद्गुरुंकडून मिळाला आहे आणि संत ज्ञानेश्वरांचे पसायदान सिध्दीस गेले आहे.
संदर्भ ग्रंथ -----पसायदान----
विद्यावाचस्पति
शंकर अभ्यंकर
==संत ज्ञानेश्वर अभंगमाला==
तेराव्या शतकापासून म्हणजे सुमारे सातशे वर्षांपासून ज्ञानदेवांची अमृतवाणी मराठी मनाला रिझवित आली आहे.आजही ज्ञानेश्वरीचे वाचन घरोघरी चालत असलेले दिसते. ज्ञानेश्वरी म्हणजे शारदेच्या गळ्यातील देशीकार लेणे म्हटले पाहिजे .ज्ञानेश्वरांचा जीवनकाल इसवी सन 12 75 ते 12 96 असा आहे अशा अल्प जीवनामध्ये त्यांनी साहित्यक्षेत्रात ,अध्यात्मिक क्षेत्रात अविस्मरणीय कार्य केले आहे आपल्या प्रतिभेला अध्यात्माची जोड देऊन त्यांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली.अमृतानुभव चांगदेव पासष्टी, अभंगाची गाथा ,ज्ञानेश्वरी हे ग्रथ संत ज्ञानदेवांचे
मानले जातात.
ज्ञानदेवांच्या तत्त्वज्ञानाचा मुख्य सिद्धांत अद्वैताचा चा आहे.सर्वत्र एकच आत्मतत्त्व भरून राहिले आहे आत्माच सर्वत्र भरला आहे ,ज्ञानदेवांनी मांडलेला विचार हा चिदविलास वाद म्हणून ओळखला जातो त्यांच्या मते जग हे परमात्मास्वरूप आहे. ज्ञानदेवांच्या उपलब्ध अभंगांची संख्या 765 आहे या अभंगातून पंढरी महात्म्य ,
विठ्ठलमहात्म्य, संतसमागम,नामस्मरण,सदाचाराचा उपदेश असे विविध विषय हाताळले आहेत.
हे अभंग सध्या,सहज,उत्कट शब्दात लिहिलेले असल्याने साध्याभोळ्या ,सहृदय माणसाच्या मनाची पकड घेतात.भावनेची आर्तता ,कल्पनेची विशालता आणि शब्दांची कोमलता या तिन्ही गुणांचा संगम ज्ञानदेवांच्या लेखनात झाला आहे .अशा मार्मिक शब्दांत शं.गो.तुळपुळे यांनी अभंगवाणीविषयी आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे.
'''अभंग---1'''
सकळमंगळनिधी। श्रीविठ्ठलाचे नाम आधी ।।1।।
म्हण कां रे म्हण कां रे साचे ।श्री विठठलाचे
नाम वाचे ।।2।।पतित-पावन साचें । विठ्ठलाचे
नाम वाचे ।।3।।बापरखुमादेविवरू साचें।श्री
विठ्ठलाचे नाम वाचे ।।4।।
'''भावार्थ--'''
जीवनातील सर्व मांगल्याचे ,पावित्र्याचे भांडार असलेले श्री विठ्ठलाचे नाम सर्वात आधी जपावे कारण तेच जीवनाचे सार आहे .पतितांचा उध्दार करून त्यांना पावन करणारे आहे. यासाठी विठ्ठलाच्या नामाचा निरंतर वाचेने जप करा असे श्री संत ज्ञानदेव या अभंगात सांगत आहेत.
'''अभंग---2'''
समाधी साधन संजीवन नाम । शांती दया सम सर्वभूती।।1।। शांतीची पै शांति निवृत्ती दातारू ।हरिनाम
उच्चारू दिधला तेणे ।। 2।।शम दम कळा विज्ञान सज्ञान।
परतोनी अज्ञान नये घरा ।।3।।ज्ञानदेवा सिध्दि साधन अवीट । भक्तिमार्ग नीट हरिपंथी ।।4।।
'''भावार्थ--'''
या अभंगात संत ज्ञानेश्वर समाधी साधना विषयी बोलत आहेत निरंतर हरिनामाचा जप केल्याने साधकाच्या अंतकरणात शांती ,सर्व भूतमात्रांच्या विषयी समभाव व दया निर्माण होते या हरिनामाची दीक्षा सद्गुरु निवृत्ती नाथांकडून मिळाली त्यामुळे मनातील शांती पलीकडील मनःशांतीचा अनुभव आला .अहंकाराचे शमन,इद्रियांच्या विषयांचे दमन या कला प्राप्त झाल्या.जिवाशिवाच्या ऐक्याचे ज्ञान झाले व अज्ञान पूर्णपणे देशोधडीला लागले.ज्ञानदेव म्हणतात की, हे साधन सिध्दी देणारे असून त्याची माधुरी अवीट आहे.साधकांसाठी हा उत्तम भक्तीमार्ग आहे.
'''अभंग--3'''
रंगा येई वो रंगा येई वो ।विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई।।1।।वैकुंठवासिनी वो जगत्रजननी वो ।तुझा वेधु माझे मनीं वो ।।2।।कटीं कर विराजित ।मुगुटरत्नजडित।
पीतांबरु कसिला । तैसा येईं का धावत ।।3।।विश्वरुप विश्वंभरे कमळनयने कमळाकरे वो । तुझें ध्यान लागो बापरखुमादेविवरे वो ।।4।।
'''भावार्थ ---'''
वैकुंठावर निवास करणाऱ्या तिन्ही जगाचे पालन ,पोषण करणाऱ्या पांडुरंगाला जननी ,विठाई,किटाई, कृष्णाई, कान्हाई अशी साद घालून संत ज्ञानदेव तिच्या भेटीचे वेध मनाला लागले आहेत असे म्हणतात.मस्तकावर रत्नजडित मुकुट धारण केला आहे,कमरेला पितांबर कसला असून दोन्ही कर कटीवर विराजमान झाले आहेत अशा पांडुरंगाने धावत येऊन भेटी द्यावी अशी विनंती करीत आहेत.कमला सारख़े कर व नयन असलेल्या ,विश्वरुपाने नटलेल्या व सर्व विश्वांत भरुन राहिलेल्या या विश्वंभराचे मनाला निरंतर ध्यान लागो अशी आळवणी संत ज्ञानेश्वर करीत आहेत.
'''अभंग--4'''
भक्तीचे तें ज्ञान वाचे नारायण ।दया ते संपूर्ण सर्वांभूतीं।।1।।
ज्ञान नारायण ध्यान नारायण ।वाचे नारायण सर्वकाळ।।2।।
संसार ग्रामीं नाम हाचि सांठा । पावाल वैकुंठा नामें एकें।।3।।
गोविंद गोपाळ वाचेसी निखळ ।पद पावाल अढळ
अच्युताचे ।।4।।नामेचि तरले शुकादिक दादुले । जडजीव
उध्दरले कलीयुगीं ।।5।।स्मरण करिता वाल्मीकी वैखरी
वारुका भीतरीं रामराम ।।6।।सर्वांमाजीं श्रेष्ठ पुण्य भू वैकुंठ।विठ्ठल मूळपीठ जगदोद्धारक ।।7।।निवृत्ती निरोपण ज्ञानदेवा ध्यान । सर्वत्र नारायण एकरुप ।।8।।
'''भावार्थ---'''
अंतरंगात सर्व प्राणिमात्रा विषयी भूतदया आणि वाचेने निरंतर नारायणाचा जप हेंच खरे भक्तीचे ज्ञान आहे.चित्तांत
नारायणाचे अखंडित ध्यान व वाचेने सर्वकाळ जप हाच संसाराच्या गावामधील मोठा पुण्यसंचय आहे.या पुण्याईने
आपण वैकुंठाची प्राप्ती करु शकतो.गोविंद गोपाळ या नावाच्या जपाने वाचेचा मल जावून वाणी शुध्द होते व अच्चुताचे अढळपद मिळते.नामाच्या या पुण्याईनेच अत्यंत
ज्ञानी,विरागी असे शुकासारखे ऋषी संसार सागर तरुन गेले आणि कलीयुगातील अनेक जडजीवांचा उध्दार केला.वाल्मिकीनी अखंड रामनामाचा जप केला की मुंग्यांनी त्यांच्या भोवती वारुळ तयार केले .या नामजपाच्या पुण्याईने ते सर्वश्रेष्ठ रामायणकर्ते लेखक बनून अजरामर झाले.सद्गुरु निवृत्ति नाथांच्या उपदेशाने ज्ञानदेवांना याच नामाचे ध्यान लागून सर्वत्र नारायणाचे रूप दिसू लागले.
'''अभंग--5'''
नाम प्रल्हाद उच्चारी । तया सोडवी नरहरी उचलूनी घेतला कडियेवरी । भक्त सुखे निवाला ।।1।।नाम बरवया बरवंट।
नाम पवित्र आणि चोखट । नाम स्मरे नीळकंठ ।निज सुखे निवाला।।2 ।। जे धुरुसी आठवलें ।तेंचि उपमन्यें घोकिले । तेंचि गजेंद्रा लाधले ।हित झाले तयांचे ।।3।।नाम स्मरे अजामेळ ।महापातकी चांडाळ।नामें झाला सोज्वळ । आपण्यासहित निवाला।।4।।वाटपाडा कोकिकु। नाम स्मरे तो वाल्मिकु ।नामे उध्दरिले तिन्ही लेकु ।आपणासहित निवाला ।।5।।ऐसे अनंत अपार । नामे तरले चराचर ।नाम पवित्र आणि परिकर । रखुमा देविवराचें ।।6 ।।
'''भावार्थ---'''
रामनामाचा सतत जप करणार्या भक्त प्रल्हादाला नरसिंहरुपाने स्तंभातून प्रकट होऊन त्याच्या पित्याच्या जाचापासून वाचवले.उचलून कडेवर घेऊन अभयदान दिले.भक्त प्रल्हाद सुखावला.भगवंताचे नाम पवित्र व अत्यंत शुध्द आहे.समुद्र मंथनातून निघालेले हलाहल प्राशन केल्यानंतर झालेला दाह शांत करण्यासाठी नीळकंठ शंकरांनी रामनामाचा जप केला ,त्यामुळे ते शांत झाले.ध्रुवाने अढळपदाची,उपमन्यूने क्षीरसागराची प्राप्ती नामस्मरणानेच करून घेतली तसेच गजेंद्राला मोक्षप्राप्ती झाली ती नामस्मरणानेच.अजामेळ नावाचा महापातकी नामामुळेच सोज्वळ झाला.लुटारू वाल्याकोळी नामस्मरणाच्या प्रभावाने वाल्मीकी ऋषी झाला.स्वत:चा उध्दार तर केलाच शिवाय तिन्ही लोकांचा उध्दार केला.रखुमादेविवराचे नाम अत्यंत पवित्र व सुंदर आहे त्याने अनंत अपार असे चराचर तरुन गेलेआहे.
'''अभंग---6'''
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ।।1।।
चरणकमळदळु रे भ्रमरा ।भोगीं तूं निश्चळु रे भ्रमरा ।।2।।
सुमनसुगंधु रे भ्रमरा । परिमळ विद़दु रे भ्रमरा ।।3।।
सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा । बाप रखुमादेविवरू रे भ्रमरा।।4।।
'''भावार्थ ---'''
या अभंगात संत ज्ञानेश्वरांनी एका सुंदर रूपकाची रचना केली आहे .देहबुद्धी असणाऱ्रा असणारा जीव म्हणजे क्षणभंगुर सुखाच्या मागे धावणारा ,भ्रमर आहे. अस्थिर, इंद्रियजन्य सुखाचा हव्यास, चंचलपणा हे त्याचे अवगुण आहेत ते सोडून त्याने शाश्वत आत्मसुखाचा शोध घ्यावा असे ज्ञानदेव म्हणतात. हा अविनाशी सुमन सुगंध त्याला रखमा देवी वराच्या चरण कमला पासून मिळेल.कारण हे चरणकमल सर्व प्रकारचे ऐहिक व पारमार्थिक सुख देणारे आहेत.हा आनंद त्याने निश्चलपणे भोगावा असे ज्ञानदेव म्हणतात.
'''अभंग --7'''
सुकुमार सुरज्ञ परिमळे अगाध । तयाचा सुख बोध सेवी आधीं ।।1 ।।मना मारी सुबुद्धि तल्लीन मकरंदीं ।विषय उपाधी टाकीं रया ।।2।।रखुमादेविवरू गुणाचा सुखाडु ।
मन बुध्दि निवाडु राजहंसु ।।3।।
'''भावार्थ--'''
सत्चिदानंद असे स्वरुप असलेला परमात्मा अतिशय सुकुमार,सुंदर ,सुगंधित आहे.रखुमादेवीचा पती केवळ शारिरीक सौंदर्याने नटला आहे असे नसून तो सर्व गुणांचे भांडार आहे.विकारी,चंचल मन व निश्चयात्मक ,स्थिर बुध्दी यातून योग्य निवड करणारा आहे.संत ज्ञानदेव सांगतात की,आपल्या मनोवासनांचे दमन करुन सुबुध्दीची कास धरुन तिला परमात्म्याच्या स्वरुपात तल्लीन करा.विषयांच्या सर्व उपाधि सोडून द्या.
'''अभंग --8'''
रामनाम वाट हेचि पैं वैकुंठ । ऐसी भगवद्गीता बोलतसे स्पष्ट ।।1।।अठरा साक्षी साही वेवादत ।चौघाचेनि मतें घेईन भागु ।।2 ।।शेवटिले दिवसीं धरणे घेईन । ।बापरखुमादेविवरा बळेंचि साधीन ।।3।।
'''भावार्थ--'''
रामनामाचा अखंड जप हे वैकुंप्राप्तिचे एकमेव साधन आहे
असे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत स्पष्टपणे सांगतात.त्या प्रमाणेच अठरा पुराणे,सहा शास्त्रे ,आणि चारी वेदांचा मागोवा घेतला तरी ते ही याला दुजोरा देतात.यासर्वांचा दाखला देवून संत ज्ञानेश्वर म्हणतात की,जीवनभर रामनामाचा जप करुन शेवटच्या दिवशी विठ्ठलाकडे धरणे धरुन त्याच्या साहाय्याने परमात्म स्वरुप प्राप्त करुन घेईन.
'''अभंग ---9'''
तुज सगुण म्हणो की निर्गुण रे । सगुण निर्गुण एकु गोविंदु रे।।1।।अनुमाने ना अनुमाने ना । श्रुती नेती नेती म्हणती गोविंदु रे ।।धृ.।। तुज स्थूल म्हणो की सूक्ष्म रे ।स्थूल सूक्ष्म एक गोविंदु रे ।।2।।तुज आकारू म्हणो की निराकारू रे। आकारू निराकारू एकु गोविंदु रे ।।3 ।। निवृत्ति प्रसादे ज्ञानदेव बोले । बापदेविवरु विठ्ठलू रे ।।4 ।।।
'''भावार्थ ---'''
भगवंताला सगुण म्हणावे का निर्गुण याचा निर्णय करता येत नाही.श्रुती सुध्दा या स्वरुपाला जाणत नाहीत असे गोविंदाचे स्वरुप अगम्य आहे.भगवंताच्या या स्वरुपाला स्थूल रुपात पहावे की सूक्ष्मांत पहावे हे समजत नाही,पण हे दोन्ही एकाच गोविंदाची रूपे आहे.भगवंताची साकार आणि निराकार ही दोन्ही रुपे एकाच गोविंदाची आहेत.निवृत्तिनाथांच्या प्रसादाने संत ज्ञानदेव म्हणतात रखुमादेवीचा वर जो विठ्ठल तोच सर्व रुपात प्रकट झाला आहे.
'''अभंग --10'''
सोनिया#चा दिनु आजि अमृते पाहिला ।नाम आठवितां रूपी प्रगट पैं झाला ।।1।।गोपाळा रे तुझें ध्यान लागो मना ।आनु न विसबे हरि जगत्रजीवना ।।2।।तनु मनु शरण विनटलों
तुझ्या पायीं ।बाप रखुमादेविवरा वाचूनि आनु नेणें कांहीं ।।3।।
साधक आपल्या आराध्या देवतेची उपासना करीत असतांना एक अत्यंत मोलाचा ,सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा दिवस त्याच्या जीवनात येतो .त्या दिवशी नामाचा जप करीत असताना त्या देवतेचे प्रत्यक्ष दर्शन साधकाला घडते, तो त्या देवतेशी एकरूप होऊन जातो. संत ज्ञानदेव म्हणतात सर्व जगाचे जीवन असलेल्या त्या विठ्ठलाचा एक क्षणभर देखील विसर पडणार नाही असे ध्यान लागावे. त्याक्षणी केवळ देहानेच नव्हे मनाने शरण जाऊन त्या स्वरूपात पूर्णपणे रंगून जाईन.तो दिवस अमृताचा असेल कारण त्यावेळी बाह्य जगाची सारी बंधने मनाच्या साऱ्या वासना गळून पडतील. या अनुभवालाच कदाचित मुक्ती म्हणत असतील.
'''अभंग---11'''
कां सांडिसी ग्रृहस्थाश्रम । का सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे तें वर्म वेगळेंची । ।1।।भस्म उधळण जटाभारू । अथवा उदास दिगंबरू । न धरीं लोकांचा अधारू । आहे तो विचारू वेगळाची ।। 2 ।।जप तप अनुष्ठान । क्रिया कर्म यज्ञ दान । कासया इंद्रियां बंधन । आहे तें निधान वेगळें ची ।।3 ।। वेदशास्त्र जाणितलें । आगमी पूर्ण ज्ञान झालें । पुराण मात्र धांडोळिलें । आहे तें राहिलें वेगळेंची ।।4 ।। शब्दब्रह्मे होसी आगळा ।म्हणती न भियें कळिकाळा । बोधेंविण सुख सोहळा । आहे तो जिव्हाळा
वेगळाची ।। 5 ।। याकारणें श्रीगुरूनाथु । जंव मस्तकीं न ठेवी हातु । निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवांतु केवी
होय । ।6 ।।
'''भावार्थ---'''
परमात्म स्वरूप जाणून घेण्यासाठी संसारी साधक आपल्या नित्य नैमित्तिक क्रिया कर्माचा त्याग करतो आपले कुळधर्म कुलाचार सोडून देतो गृहस्थाश्रमा पासून अलग
होतो. पण त्या मुळे परमात्मस्वरूपाचे पूर्ण ज्ञान होणार नाही
कारण ते रहस्य वेगळेच आहे .सर्वांगाला भस्म फासून ,जटांचा भार वाढवून ,सगेसोयरे,मित्र यांचा आधार सोडून,उदासिन वृत्ती धारण करून संन्यासी बनतो पण त्या मुळे परमात्म्याचा बोध होतोच असे नाही कारण तो वेगळाच आहे.इंद्रियांचे दमन करुन ,जप तप अनुष्ठान करून अनेक प्रकारचे यज्ञ व दाने करून परमेश्वराची प्राप्ती होणार नाही
कारण ते सुखाचे निधान वेगळेच आहे.
अठरा पुराणे, सहा शास्त्रे, चारी वेद यांचे पूर्ण ज्ञान झाले तरी परमात्म स्वरूपाचे ज्ञान शब्दातीत आहे.या ज्ञानाने केवळ अहंकार वाढेल, कळीकाळाची भिती वाटेनाशी होईल.
पण देव भेटणार नाही. अपार श्रध्देने गुरुवाक्य श्रवण करून गुरु उपदेशाचा पूर्ण बोध झाल्याशिवाय गुरुकृपेचा
सुखसोहळा साजरा करता येणार नाही.जो पर्यंत श्रीगुरुनाथ मस्तकावर हात ठेवून कृपाप्रसाद देणार नाहीत
तोवर साधक पूर्ण ज्ञानी ,निवांत कसा होईल? असे संत ज्ञानेश्वर विचारतात.
'''अभंग--12'''
बरवा वो हरी बरवा वो । गोविंद गोपाळ गुण गुरुवा वो।।धृ।
सावळा वो हरी सावळा वो ।मदन मोहन कान्हो गोवळा
वो ।।1 ।।पाहता वो हरी पाहता वो । ध्यान लागले वो चित्ता
वो ।।धृ ।। पढिये वो हरी पढिये वो । बाप रखुमा देवी वरू
घडीये वो ।।2।।
'''भावार्थ---'''
या अभंगातिल विठोबाच्या रंगरूपाचे व गुणांचे वर्णन करतांना ज्ञानोबांची वाणी अधिकच कोमल,लडिवाळ बनली आहे.गोविंद गोपाळ अशी नावे श्रीहरीला शोभून दिसतात.तो रुपाने अतिशय उत्तम (बरवा)असून गुणांमध्ये सर्वोत्तम आहे.त्याचे रूप मदना सारखे मनमोहक असून सावळ्या
वर्णाने तो शोभून दिसत आहे.हरीचे हे रूप पाहतांच मनाला त्याचे ध्यान लागते व हरघडीला तो अधिकच आवडू लागतो.
'''अभंग --13'''
त्रिभंगी देहुडा ठाण मांडूनिया माये ।कल्पद्रुमातळी वेणू
वाजवित आहे. ।।1।। गोविंदु वो माये गोपाळु वो । सबाह्य
अभ्यंतरी अवघा रमानंदु वो ।।2।। सावळे सगुण सकळा
जिवांचे जीवन घनानंद मुर्ती पाहता हारपले मन ।।3।।शून्य
स्थावर जंगम व्यापुनि राहिला । बाप रखुमा देवीवरू
विठ्ठल सकळ ।।4।।
'''भावार्थ---'''
कटी, गुडघे आणि मांड्या यांना वाकवून ,डाव्या पायावर उजवा पाय ठेवून कल्पवृक्षा खाली सुमधुर वेणू वाजवित उभा असलेला हरी अंतर बाह्य आनंदस्वरूप आहे,हरीचे हे सावळे ,सगुण रूप म्हणजे सर्व जीवांचे जीवन आहे.हा मेघश्याम पाहताच मन हरपून जाते. स्थावर जंगम सृष्टिच नव्हे तर सर्व विश्वाची पोकळीच त्याने व्यापून टाकली आहे.असा हा रखुमादेवीवर विठ्ठल आकलनाच्या पलिकडे आहे.
'''अभंग ---14'''
स्वप्निंचेनि सुखे मानिताती सुख ।घेतलिया विख जाईल
देह ।।1।। मौलाचे आयुष्य दवडितोसी वायां । माध्यान्हींची
छाया जाय वेगीं ।।2 ।।वेगीं करीं भजनां काळ यम श्रेष्ठ ।
कैसेंनी वैकूंठ पावशील झणें ।।3।।बापरखुमादेवीवरु विठ्ठल उभा । सर्वत्र घटीं प्रभा त्याची आहे.
'''भावार्थ---'''
परमार्थाचा विचार करू जातां संसार मायिक (खोटा,क्षणभंगूर) आहे. स्वप्नातील सुख जसे क्षणिक असते
तसेच देहबुध्दीने मानलेले संसारसुख विषा सारखे देहनाशास कारणीभूत होते.ज्या प्रमाणे माध्यान्हकाळी
आपली सावली आपल्याला दिसेनाशी होते त्या प्रमाणे संसारसुखे भासतात.हे लक्ष्यांत घेऊन काळ व्यर्थ न दवडता
सर्वाघटी विराजमान असलेल्या विठ्ठलाचे भजन करावे.वैकुंप्राप्तीचे तेच एकमेव साधन आहे नाहीतर यमलोकी दंड भोगण्याची वेळ येईल.
'''अभंग 15---'''
पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा । विठा देखियेला डोळां
बाईये वो ।।1।।वेधलें वो मन तयाचिया गुणीं । क्षणभर न विसंबे विठ्ठलरुक्मिणी ।।2।।पौर्णिमेचें चांदिणें क्षणक्षणां
होय उणें । तैसे माझे जिणे एका विठ्ठलेवीण ।।3 ।।
बापरखुमादेविवरू विठ्ठलचि पुरे ।चित्त चैतन्य मुरे बाईं
येवो ।।4।।
'''भावार्थ ---'''
पंढरपुरीचा निवासी निळसर मेघासारखा जणूं काही लावण्याच्या मुशीतून ओतलेला पुतळाच!डोळ्यांनी पाहिल्यावर मन त्याच्या रूपागुणांनी वेधले गेले.एक क्षणभर देखील ते रूप विसरतां येणार नाही.पौर्णिमेच्या चांदण्याची शितलता व सौंदर्य जसे प्रत्येक क्षणी कमी होत जाते तसे मनाचे सौख्य विठ्ठलाच्या दर्शनाशिवाय उणे होत जाते .बापरखुमादेविवरू विठ्ठलाने मनाचे चैतन्य
पूर्णपणे व्यापून टाकले आहे.
'''आभंग---16'''
इवलेसे रोप लावियेले द्वारीं ।त्याचा वेल गेला गगनावरी।।1।
मोगरा फुलला मोगरा फुलला। फुले वेंचितां बहरू कळियांसी
आला ।।2 ।। मनाचिये गुंती गुंफियेला शेला ।
बापरखुमादेविवरू विठ्ठलीं अर्पिला ।।3।।
'''भावार्थ --'''
चित्त प्रागणांच्या दारांत छोटेसे मोगर्याचे रोप लावले.त्याचा
वेल इतका फोफावला की आकाशाला भिडू लागला.या वेलाला सुखदु:खरुपी आशा-आकांक्षाची ,वासनांची अनेक
फुले लगडली.जसजशी फुले खुडली तसा नविन कळ्यांचा
बहर येत होता.मनामध्ये या फुलांचा शेला गुंफून तो श्री
विठ्ठलाला अर्पण केला.अशा रितीने सर्व कर्मफले परमात्म
स्वरुपी अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या कर्मबंधनातून सुटका झाली असे संत ज्ञानदेव म्हणतात.
'''अभंग---17'''
रामकृष्ण जपा सोपा । येणें हरती जन्मखेपा । संसारु तुटेल
महापापा । धन्य भक्त तो घरातळीं ।।1।।जया हरीची जपमाळी । तोचि पडिला सर्व सुकाळीं । तया भय नाही कदाकाळीं ऐसे ब्रह्मा बोलियेला ।।2 ।।बापरखुमादेवी हरि ।
नामे भक्तासी अंगिकारी ।नित्य सेवन श्रीहरि । तोचि हरीचा भक्त जाणावा ।।3।।
'''भावार्थ---'''
रामकृष्ण हा जप अगदी सोपा असून महापापाचे क्षालन
करण्याचे सामर्थ्य त्यात आहे.जन्म मरणाचा फेरा चुकविण्याचे ते ऊत्तम साधन आहे.ज्याच्या जवळ हरीची जपमाळ आहे,तो निरंतर सुखी समाधानी धन्य भक्त होय.तो कळीकाळाच्या भया पासून मुक्त होतो असे परमपिता ब्रह्मदेवांनीच सांगितले आहे.नित्य नामस्मरणी दंग असलेल्या भक्तांचा श्रीहरि अमंगिकार करतो. तोच हरिचा खरा भक्त जाणावा.
'''अभंग ---18'''
योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।पाहतां पाहतां मना
न पुरेचि घणी .।।1।। देखिला देखिला माय देवाचा देवो ।
फिटला संदेहो निमालें दुजेपण ।।2।। अनंतवेषें अनंतरूपें
देखिलें म्या त्यासी ।बापरखुमादेवीवर खूण बाणली
कैसी ।।3।।
'''भावार्थ---'''
सर्वश्रेष्ठ योग्यांनाही ज्याचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे तो परमात्मा जेव्हां प्रत्यक्ष पाहिला तेव्हां कितीही वेळ पाहिला
तरी मनाची तृप्तीच होत नाही अशी मनाची अवस्था झाली.
तो देवाधिदेव भेटल्यानंतर मनातील मी-तू पणाची भावना ,
सर्व द्वैत संपून गेले, सगळे संदेह समूळ नाहीसे झाले.
तोच पांडुरंग सर्वत्र अनंत रूपाने ,अनंत वेषाने नटला आहे
अशी मनोमन खात्री पटली.
'''अभंग---19'''
माझे जिवीची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।।1 ।।
पांडुरंगीं मन रंगले । गोविंदाचे गुणीं वेधलें ।।2 ।।
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे । पाहतां रूप आनंद
साठवे ।।3 ।।बापरखुमादेविवरू सगुण निर्गुण ।
रूप विटेवरी दाविली खूण ।।4 ।।
'''भावार्थ---'''
पंढरपुरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेतांना त्या सगुणस्वरुपात मन रंगून जाते.गोविंदाच्या गुणांनी मन त्या कडे आकर्षित होते, गुंतून पडते. आपण जागे आहोत की झोपेत स्वप्न पहात आहोत अथवा गाढ झोपेत आहोत हेच कळेनासे होते.गोविंदाचे रुप सतत डोळ्यांपुढे असल्याने चित्तामध्ये आनंद भरुन वाहतो आहे असे वाटते.जो निर्गुणनिराकार परमात्मा तोच भक्तांसाठी सगुण रुपात विटेवर
उभा आहे अशी मनोमन खात्री पटते.ही गोजिरवाणी मूर्तीआपल्या विशेष आवडीची आहे असे संत ज्ञानदेव म्हणतात.
'''अभंग---20'''
अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही
लोक ।।1 ।।जाईन गे माय तया पंढरपुरा । भेटेन माहेरा आपुलिया ।।2।।सर्व सुकृताचे फळ मी लाहीन । क्षेम मी
देईन पांडुरंगी ।।3।। बापरखुमादेविवरु विठ्ठलेशीं भेटी ।
आपुले संवसाठी करून ठेला ।।4 ।।
'''भावार्थ ----'''
अवघा संसार सुखपूर्ण आनंदाने भरून टाकीन स्वर्ग ,पृथ्वी,पाताळ हे तिन्ही लोक ब्रह्मानंदाने भरीन ही ज्ञानदेवांच्या मनीची कामना आहे.पंढरपूर हे सर्व संताचे
माहेर आहे,ज्ञानदेवांना या माहेराची आस लागली आहे.
आपण जीवनात जी सत्कृत्ये केली असतील त्याचे फळ
म्हणजे पांडुरंगाचे दर्शन अशी संत ज्ञानेश्वरांची श्रध्दा आहे.
आपल्या सर्व पुण्याचे फळ एकत्र करून आपण विठ्ठलाची भेटी(आलिंगन) घेऊ असे संत ज्ञानदेव म्हणतात.
'''अभंग --21'''
जंववरी तंववरी जंबुक करी गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं बाप ।।1 ।। जंववरी तंववरी वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता द्दष्टी देखिली नाही बाप ! ।।ध्रु ।।
जंववरी तंववरी मैत्रत्त्व संवाद जंववरी अर्थेसी संबंध पडिला नाही बाप । ।2।।जंववरी तंववरी युध्दाची मात । जंव परमाईचा पूत देखिला नाही बाप ! ।। 3।।जंववरी
तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाही बाप !।।4 ।।जंववरी तंववरी बाधी हा संसार ।जंव रखुमादेविवरू देखिला नाही बाप ।।5।।
'''भावार्थ---'''
जोवर सिंहाचे दर्शन झाले नाही तो पर्यंतच कोल्होबाची गर्जना , वैराग्याच्याच्या गोष्टी जोपर्यंत सौदर्यशालिनी स्त्री
दर्शन होत नाही तोपर्यंतच ! धनाशी संबंध आला की, घनिष्ठ मैत्री लुप्त होण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही.
जो पर्यंत प्रत्यक्ष युध्द भूमीवर बलाढ्य योध्द्याशी गाठ पडत नाही तोवर शौर्याच्या बढाया केल्या जातात.प्रचंड उसळणार्या लाटांसह गर्जना करणारा समुद्र अगस्ती ऋषींचे दर्शन होतांच शांत होतो.जो पर्यंत रखुमादेवीवराला पाहिले नाही तोवरच या मायावी संसाराचे भय वाटते.या अभंगात त्
समर्पक उपमांचा उपयोग करून पाडुंरंगाचा महिमा वर्णनप केला आहे.
'''अभंग --22'''
साधूचा महिमा वर्णवेना कांहीं । ब्रह्मादिक तेही वर्णिताती।।1।। त्याचिये कृपें मोक्ष जिऊनियां । लाधिजे प्राणिया निश्चयेंसी ।।2।।गंगेहूनि थोर संत शुचिष्मंत ।
गंगा शुध्द होत त्याचे संगे ।।3।।वडवानल शुचि परी सर्वही भक्षक । इंद्र पुण्यश्लोक पतन होय ।।4।।पतितपावन क्रुपाळ समर्थ । देताती पुरुषार्थ चारी दिना ।।5।।बाप रखुमादेविवर विठ्ठलाच्या संगी । झाला पूर्ण योगी ज्ञानेश्वर ।।6।।
'''भावार्थ---'''
या अभंगात संत ज्ञानेश्वर सत्संगतिचा महिमा वर्णन करीत आहेत.साधु संगतीचा महिमा ब्रह्मा ,विष्णु, महेश हे तिन्ही
देवही वर्णन करु शकत नाही.संत ज्ञानेश्वर म्हणतात की,साधुंच्या संगतीने जीवाला मोक्षाचा लाभ होतो.येथे संत ज्ञानेश्वर साधुंची तुलना गंगा,वडवाग्नी ,देवराज ईंद्र यांच्याशी करतात . गंगा ही अत्यंत पतवित्र नदी समजली जाते परंतु वाराणसीला येईपर्यंत ती प्रदुषित होते पण साधुंच्या संगतीने ती शुध्द होते.पुण्यश्लोक इंद्र पुण्य क्षीण होतांच तो पतित होतो.परंतु क्रुपाळू व समर्थ संत शरणागताला चारी पुरुषार्थ (धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष )
देऊन क्रुतार्थ करतात.संत ज्ञानेश्वर म्हणतात की, विठ्ठलाचे संगतीने आपण पूर्ण योगी झालो आहोत.
'''अभंग--23'''
योग तो कठिण साधितां साधेना । जेणें गा चिद्घना न पाविजे ।।1।। याची लागीं आतां सांगणे हें तुज । माझे निजगुज अंतरींचे ।।2।।इंद्रिये कोंडावी आवरावें मन । सहज
ब्रह्मज्ञान लाधलाशी ।।3।।जेथें जेथें म धावोनिया जाय तेथें गुरूचे पाय बसवावे ।।4 ।।ज्ञानदेव म्हणे होईं तूं निर्गुण।
कळेल तुज खूण पूर्ण तेव्हां ।।5।।
'''भावार्थ ---'''
संत ज्ञानेश्वर या अभंगात म्हणतात की,अष्टांग योग साधणे अत्यंत कठीण आहे कारण माणसाचे मन अतिशय चंचल
असून त्याला वश करणे दुरापास्त आहे.अष्टांग योगाद्वारे
परमेश्वर प्राप्ती अवघड आहे.या साठी संत ज्ञानेश्वर साधकाला आपल्या मनीचे रह्स्य सांगत आहेत.मनावर नियंत्रण आणून इंद्रियांवर ताबा आणावा त्यामुळे सहजपणे ब्रह्मज्ञान लाभेल.या साठी गुरुवर नितांत श्रध्दा ठेऊन जेथे जेथे मन जाईल तेथेतेथे गुरुचरणांचे ध्यान करावे.संत ज्ञानेश्वर म्हणतात की, या प्रकारे देहबुध्दी कमी होऊन सत्व, रज तमोगुणा पलिकडे जाऊन निर्गुणता मिळणे शक्य
होईल व त्या मुळे परमात्म्याचे खरे स्वरुप समजून येईल.
'''अभंग--24'''
सद्गुरुसारिखा सोयरा सज्जन ।दाविले निधान वैकुंठीचे।।1।।सद्गुरु माझा जिवाचा जिवलग । फेडियेला पांग प्रपंचाचा ।।2।।सद्गुरु हा अनाथ माउली । क्रुपेची साउली केली मज ।।3।।ज्ञानदेव म्हणे अवचित घडलें ।निव्रुत्तीनें दिधलें निजबीज ।।4।।
'''भावार्थ---'''
संत ज्ञानेश्वर म्हणतात सद्गुरु सारखा सज्जन सोयरा मिळणे अवघड आहे.वैकुंठीचे निधान सद्गुरुमुळेच लाभले आहे.सद्गुरु हा आपल्या अंतरिचा जिवलग आहे,त्यांच्या
क्रुपेमुळेच प्रपंच्याच्या बंधनामधून मुक्त झालो.सद्गुरु हे अनाथांची माउली असून प्रपंच्याच्या तापातून सोडवणारी
क्रुपेची सावली आहे.ज्ञानदेव म्हणतात की,अवचित घडले
व सद्गुरु निव्रुत्तिनाथांच्या क्रुपेने आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.
'''अभंग ---25'''
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण । ब्रह्मसनातन विठ्ठल हा।।1।। पतितपावन मानसमोहन।ब्रह्म सनातन विठ्ठल
हा ।।2।।ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन । ब्ह्मम सनातन
विठ्ठल हा।।3।।ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन। ब्रह्म सनातन विठ्ठल हा ।।4।।
'''भावार्थ ---'''
संत ज्ञानेश्वर म्हणतात की, हा विठ्ठल निर्गुण रुपाने प्रत्यक्ष ब्रह्माचे सनातन रुप आहे तर विटेवरचा पांडुरंग हे
विठ्ठलाचे साजिरे सगुण स्वरुप असून दोन्ही विलक्षण
आहे.हा सगुण विठ्ठल पतितांचा उध्दारक असून मनमोहक आहे तर निर्गुण रुपाने तो ध्येय ध्याता ध्यान या त्रिपुटीहून वेगळा (ध्यान करणारा,ज्याचे ध्यान करायचे तो व ध्यान हे
जेव्हा एकरुप होते ,द्वैत संपून अद्वैताचा विलक्षण अनुभव येतो.)असून सनातन ब्रह्म आहे .हा विठ्ठल सगुण आणि निर्गुण दोन्ही रुपात आनंदमय आहे.
'''अभंग--26'''
अरे अरे ज्ञाना झालासी पावन । तुझें तुज ध्यान कळों
आलें ।।1।।तुझा तूंचि देव तुझा तूंचि भाव । फिटला संदेह
अन्यतत्तवीं।।2।।मुरडुनियां मन उपजलासी चित्तें । कोठें
तुज रितें न दिसे राया ।। 3।।दीपकी दीपक मावळल्या
ज्योती । घरभरी वाती शून्य झाल्या ।।4।।व्रुत्तीची निव्रुत्ती
आपणासकट । अवघेंची वैकुंठ चतुर्भुज ।।5।। निव्रुत्ति
परमानुभव नेमा । शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ।।6।।
'''भावार्थ---'''
या अभंगात संत ज्ञानेश्वरांची क्रुतार्थततेची भावना व्यक्त झालेली दिसते.परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी ज्या ध्यान मार्गाचा अवलंब केला त्याचे रहस्य संत ज्ञानेश्वरांना समजल्यामुळे आपण पावन झालो असे ते म्हणतात. ज्याचेध्यान करायचे तो पांडुरंग आपणच असून त्याच्या वरील
भक्तीभावही आपलाच आहे ,तसेच ध्यानाची क्रियाही आपणच आहोत असा विलक्षण अनुभव आला.त्रिपुटी सांडली ,देव भक्त एकरुप झाले.द्वैत संपून अद्वैताचा अनुभव
आला ,मनातील सर्व संदेह लयास गेले.चंचल मनावर बंधन
घातल्याने चित्त शुध्द होऊन आत्मबोध झाला.सर्व विश्व
एकाच चैत्यन्याने व्यापले असून परमात्म्या शिवाय कोठेही
रितेपण नाही असा साक्षात्कार झाला,मनातील वासना,
प्रपंच्यातील आसक्ती शून्य झाली.सर्व त्रैलोक्य चतुर्भुज
पांडुरंगाचे वैकुंठ बनले.निव्रुत्तिनाथांनी दाखवलेल्या ध्यान
मार्गावरील या परम अनुभवाने संत ज्ञानेश्वरांना क्षमा व शांतीचा अपूर्व लाभ झाला.
'''अभंग---27'''
दृष्टिमाजी रूप लखलखीत देखिलें । अव्यक्त ओळखिले तेजाकार ।।1।। सावळे सुंदर रुप बिंदुलें ।मन हें मुरालें
तयामाजीं ।।2।।अणुरेणु ऐसें बोलती संतजन । ब्रह्मांड
संपूर्ण तया पोटीं ।।3।।निव्रुतिची खूण ज्ञानदेव पावला।
सोयरा लाधला निव्रुत्तिक्रुपें ।।4।।
'''भावार्थ---'''
या अभंगात संत ज्ञानेश्वर आत्मसाक्षात्काराचे वर्णन करीत आहेत.परमात्म्याचे अव्यक्त ,तेजोमय, लखलखीत रुप आपण आपल्या अंतरदृष्टीने पाहिले आणि अंतरमनाला त्याची ओळख पटली.सावळ्या रंगाचे,सुंदर असे ते बिंदुरुप पाहून मन त्यातच एकरुप झाले.अणुरेणु सारख्या या बिंदुल्या रुपात सर्व ब्रह्मांड सामावले आहे असे संतजन सांगतात.निव्रुत्तिनाथांची क्रुपा झाल्यानेच आपल्याला ह्या परम अनुभवाची प्राप्ती झाली असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.
'''अभंग--28'''
विश्वाचे आर्त माझ्या मनीं प्रकाशलें ।अवघेंचि जालें
देहब्रह्म ।।1।।आवडीचें वालभ माझेनी कोंदाटलें ।नवल
देखिलें नभाकार गे माये ।।2।।बापरखुमादेविवरू सहज
निटु जाला। ह्रदयीं नटावला ब्रह्माकारें।।3।।
'''भावार्थ---'''
निर्गुण,निराकार परमात्मा हे विश्वाचे ब्रह्मरुप ते आपल्या मनात प्रकाशमान झाल्यामुळे आपला संपूर्ण देहच ब्रह्मरुप झाला.अत्यंत आवडीच्याअशा ह्या ब्रह्मरुपानेआपल्या मनाचा गाभारा व्यापून टाकला.हे आकाशतत्वी नभाकारब्रह्मरुप पाहून मन आश्चर्याने भरुन गेले. रखुमापती श्री विठ्ठल आपणास सहज प्रप्त झाला आणि ब्रह्मरुपाने आपल्या ह्रदयांत स्थिर झाला.
'''अभंग --29'''
योगिया दुर्लभ तो म्यां देखिला साजणी ।पाहतां पाहतां मना
न पुरेचि घणी ।।1।।देखिला देखिला माय देवाचा देवो ।
फिटला संदेहो निमालें दुजेपण ।।2।। अनंतवेषे अनंतरुपें
देखिलें म्यां त्यासी । बापरखुमादेविवरु खूण बाणली कैसी।।3।।
'''भावार्थ---'''
सर्वश्रेष्ठ योग्यांनाही ज्याच्या दर्शनाचा लाभ होत नाही असा परमेश्वर आपण प्रत्यक्ष पाहिला असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.या देवाधिदेवाला कितीही वेळ पाहिले तरी मनाचेसमाधान होत नाही.त्या पांडुरंगाला पाहतांच मनाचे मी-तूपण संपून गेले.सर्व संदेह लयाला गेले.अद्वैत भावना व नि:संदेह मन हीच त्याच्या दर्शनाची खूण आहे ती मनालापटली.या संपूर्ण चल- अचल स्रुष्टीमध्ये, अनंत प्राणीमात्रांमध्ये हे चैतन्यतत्व अनंत रुपाने,अनंत वेषाने नटलेले दिसले.
'''अभंग--30'''
गुरु हा संतकुळीचा राजा । गुरु हा प्राणविसांवा माझा ।
गुरूवीण देव जाऊ। पाहतां नाहीं त्रिलोकीं ।।1।।गुरु हा प्रेमाचा आगरू । गुरु हा धैर्याचा डोंगरू ।कदाकाळी डळमळेना ।।2।।गुरु वैराग्याचे मूळ । गुरु हा परब्रह्म केवळ।
गुरु सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ।।3।।गुरु हा साधकाशी साह्य। गुरु हा भक्तालागी माय । गुरु हा कामधेनु गाय ।भक्तांघरी दुभतसे ।।4।।गुरु घाली ज्ञानांजन
गुरु दाखवी निजधन । गुरु सौभाग्य देऊन ।साधुबोध
नांदवी।।5।।गुरु मुक्तीचे मंडन । गुरु दष्टांचें दंडन । गुरु
पापाचे खंडन । नानापरी वारितसे ।।6।।
'''भावार्थ ---'''
आपल्या गुरुमाउलीला’ संतकुळीचा राजा ‘असे संबोधून श्री गुरुंचा महिमा या अभंगात वर्णन केला आहे.गुरु आपला प्राणविसावा असून तो सुखाचा सागर,प्रमाचेआगर व कधिही विचलित न होणारा धैर्याचा डोंगर आहेअसे सांगून संत ज्ञानेश्वर आपल्या गुरुंचा गौरव करतात.सद्गुरु निव्रुतिनाथ हे प्रत्यक्ष परब्रह्ममच आहेत कारण ते वैराग्याचे मूळ असून जन्म मृत्युच्या,लिंगदेहाच्या गाठी तात्काळ सोडवतात.निव्रुतिनाथ हे श्री शंकराचे अवतार आहेत असे सर्व संत मानतात.सद्गुरुंमुळे साधकास आत्मज्ञान प्राप्त होऊन ,लिंगदेहापसून मुक्त होऊन मोक्षाप्रत जातो.गुरु हा साधकांचा सहाय्यक असून भक्तांची माऊली आहे.भत्ता घरची कामधेनु आहे.श्री गुरु हा साधकाच्या डोळ्यात अंजन घालून साधकाला आपले निजधन म्हणजे आत्मरूप दाखवतात. साधकाला बोध देऊन त्याच्या अंगी साधुत्व
बाणवतात. गुरु साधकाच्या पापांचे खंडन करून त्यांच्या मुक्तीचे दार उघडतात.
'''अभंग ---31'''
आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा धनु ।।1।। हरि पाहिला रे हरि पाहिला रे । सबाह्य अभ्यंतरीं अवघा व्यापक
मुरारी ।।ध्रु ।।द्दढ विटे मन मुळीं । विराजीत वनमाळी।।2।।
बरवा संत समागमु प्रगटला आत्मारामु ।।3।।क्रुपासिंधु करुणाकरु। बापरखुमादेविवरु ।।4।।
'''भावार्थ---'''
अमृताचा वर्षाव करणारा आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्या जोगा आहेअसे संत ज्ञानेश्वर म्हणतात कारण त्यांना आज श्रीह्ररीचा साक्षात्कार झाला आहे.विश्वाच्या आत व बाहेर सर्वत्र तोच मुरारी व्यापून राहिला आहे.सगुणरुपाने तोच मुरारी दृढपणे वीटेवर विराजमान झाला आहे.संपूर्ण चराचरांवर करुणा करणारा वनमाळी क्रुपेचा सागर असून संतक्रुपे मुळेच तो बापरखुमादेवीवरु
आज सोनियाच्या दिनी प्रगटला आहे असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.
'''अभंग ---32'''
श्रीगुरुसारिखा असतां पाठिराखा ।इतरांचा लेखा कोण
करी ।।1।।राजयाची कांता काय भीक मागे ।मनचिये जोगें सिध्द पावे।।2।।कल्पतरुवटीं जो कोणी बैसला ।काय वाणी त्याला सांगिजो जी ।।3।।ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।
आतां उध्दरलों गुरुक्रुपें ।।4।।
'''भावार्थ---'''
संत ज्ञानेश्वर म्हणतात की, सद्गुरु निव्रुत्तिनाथां सारखा सबळ पाठीराखा असतांना इतरांच्या मदतीची अपेक्षा कुणीही करणार नाही. ऐश्वर्यसंपन्न राजाच्या राणी सारखे
सर्व सुखोपभोग सिध्द असतांना कुणापुढे पदर पसरण्याचे कांहीच प्रयोजन नाही.इच्छिले फळ देणाय्रा कल्पवृक्षाखाली बसलेल्या भाग्यवंताला कसलीच उणीव भासणार नाही.संत ज्ञानेश्वर अत्यंत समाधानाने सांगतात की,गुरुक्रुपे मुळे आपण हा दुर्धर संसार तरुन गेलो,आपला उध्दार झाला.
'''अभंग--33'''
मन हे ध्यालें मन हे ध्याले पूर्ण विठ्ठलची झालें। अंतरबाह्य
रंगुनी गलें विठ्ठलची ।।1।।विठ्ठल म्हणतां हरलें पाप पदरी आलें पुण्य माप झाला दिनाचा मायबाप
विठ्ठलची ।।2 ।। विठ्ठल जळीं स्थळीं भरला ठाव कोठें नाहीं उरला । आज म्यां दृष्टीने पाहिला विठ्ठलची ।।3।।
ऐसा भाव धरुनी मनीं विठ्ठल आणिला निजध्यानी ।अखंड
वदो माझी वाणी विठ्ठलची ।।4।।तो हा चंद्रभागेतीरा
पुंडलिके दिधला थारा । बापरखुमादेविवरा जडलें पायीं
विठ्ठलची ।।5।।
'''भावार्थ---'''
परमार्थातील एका अलौकिक अनुभवाचे वर्णन या अभंगात संत ज्ञानेश्वर करीत आहेत.मन विठ्ठलरुपाने पूर्णपणे व्यापून टाकल्याने मनाचे उन्मन झाले. विठ्ठलरुपात ते आतून बाहरून रंगून गेले.अनंत जन्माच्या पापाचे क्षालन झाले,अमाप पुण्य पदरांत पडले.आपल्या सारख्या दीनाला विठ्ठला सारखा श्रेष्ठ मायबाप मिळाला.जळी,स्थळी , काष्ठी पाषाणींसर्वत्र विठ्ठलच भरला आहे कोठेच रिता ठाव नाही हा विलक्षण अनुभव आला.आपल्या पार्थिव नयनांना विठुदर्शनाचा प्रत्यक्ष लाभ झाला आणि वाणीने विठ्ठलाचे नाम अखंड जपावे असा छंद मनाला लागला.मन या विठ्ठलाच्या पदकमलाशी कायमचे जडून गेले.हाच तोरखुमादेविवर की जो पुंडलिकाच्या भक्तिसाठी चंद्रभागेतिरी
कायमचा स्थिर झाला.
'''अभंग--34'''
श्रवण त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । दशहि इंद्रिये जाण हरीच्या
ठायीं ।।1।।अवघा हा गोविंदु अवघा हा मुकुंद ।अवघा हा
विद्गदु भरला असे ।।2।।पतितपावन नामें दिनोध्दारण।
स्मरिलिया आपण वैकुंठ देतु ।।3।।ज्ञानदेव म्हणे पुंडलीक जाणें। अंतकाळीं पेणें साधियेलें ।।4।।
'''भावार्थ ---'''
ज्या साधकाचे कान, त्वचा ,डोळे,जीभ, नाक ह्या सर्व
ज्ञानेंद्रियासह पांचही कर्मेंद्रियें श्री हरीच्या ठिकाणि गुंतून
राहिली आहेत त्याला सर्वत्र श्रीहरीच भरून राहिला आहे याची प्रचिती येते.पतितांना पावन करणारा हा दिनोध्दारक
श्रीहरी परमदयाळू असून केवळ स्मरण केल्याने तो सर्वश्रेष्ठ
अशा वैकुंठात स्थान देतो.संत ज्ञानेश्वर म्हणतात की,
पुंडलिकाला हे माहिती असल्याने त्याला वैकुंठप्राप्ती सहज
साध्य झाली.
'''अभंग ---35'''
सर्वव्यापक सर्व देहीं आहे । परी प्राणियांसी सोय न कळे त्याची ।।1।।परमार्थ तो कडु विषय तो गोडु। तया अवघडु
संसार ।।2।।नामाचें साधन जिव्हे लावी बाण । तया अनुदिन
जवळी असे ।।3।।धारणा धीट जरी होय विनट । तया वैकुंठ जवळी असे ।।4।।सुलभ आणि सोपारेंकेलेंस दातारें। आमहीं एकसरें उच्चारिलें ।।5।।ज्ञानियासी ज्ञान ज्ञानदेवी ध्यान ।कलिमलछेदन नाम एक ।।6।।
'''भावार्थ---'''
आत्मचैतन्य हे सर्वत्र,सर्वदेही,अणुरेणूत व्यापलेले आहे.पण
देहबुध्दीमुळे जीवाला त्याचे अज्ञान आहे.त्यामुळे त्याला विषयांत गोडी वाटते व परमार्थ कडू वाटतो.संसारातील
दु:खाचे हेंच मूळ कारण आहे असे संत सांगतात.त्या साठी
नामजपाची सवय हा योग्य मार्ग आहे.जो सातत्याने नामजपात तल्लीन होईल त्याला त्या विषयी प्रेम निर्माण होईल व अंती सायुज्यमुक्ती मिळेल असे संतांचे मत आहे.
ज्ञानमार्गी ज्याला ज्ञान व ध्यानमार्गी ज्याला ध्यान म्हणतात
हे एक केवळ हरीचे नामच आहे आणि हरीनाम कलिमलछेदक आहे असे संत ज्ञानेश्वर सांगतात.
'''अभंग ---36'''
जन्मजन्मांतरी । असेल पुण्यसामुग्री ।तरीच नाम जिव्हाग्रीं
येईल रामाचें ।।1।।धन्य कुळ तयाचें रामनाम हेंचि वाचे ।
दोष हरतील जन्माचे । श्री राम म्हणतांची।।2।कोटीकुळाचें उध्दरण । मुखी राम नारायण ।रामक्रुष्ण स्मरण ।धन्य जन्म
तयाचे ।।3।।नाम तारक सांगडी ।नाम न विसंबे अर्धघडी ।
तप केलें असेल कोडी ।तरीच नाम येईल ।।4।।ज्ञानदेवीं अभ्यास मोठा । नामस्मरण मुखावाटा । पूर्वज गेले वैकुंठां।
हरिहरि स्मरतां ।।5।।
'''भावार्थ---'''
मागील जन्माचे जर पुण्य असेल तरच जिभेवर श्रीरामाचे नाव येईल. ज्याच्या वाणीत श्रीरामाचे नाव आहे त्याचे कुळ धन्य होय त्या रामनामाच्या जपाने जन्मांतरीचे दोष निघून
जातील आणि कोटी कुळांचा उद्धार होईल धन्य त्याचा जन्म जो क्षणभरसुध्दा रामनाम विसरत नाही. अनेक जन्माचे तप असेल तरच हरीनाम मुखी येईल.हरीच्या नामस्मरणाचा
सतत सराव असल्यानेच आपले कुळ वैकुंठाला गेले असा स्वानुभव संत ज्ञानेश्वर सांगतात.
'''अभंग---37'''
त्रिभुवनीचे सुख एकतत्व विठ्ठल । नलगे आम्हा मोल
उच्चारितां ।।1।।विठ्ठल उघडा मंत्र कळिकाळा त्रास ।
घालुनियां कांस जपों आधीं ।।2।। सत्वर सत्वाचे जपती
नामावळी । नित्यता आंघोळी घडे राया ।।3।। बापरखुमादेविवरु जिव्हाळा ह्रदयीं । जीवाचा जीव
ठायीं एक पाही ।।4।।
'''भावार्थ---'''
त्रिभुवनात एकवटलेले सर्व सुख म्हणजे एकतत्व विठ्ठल होय की,ज्या साठी आम्हाला कोणतेच मोल द्यावे लागत नाही.विठ्ठल या नाममंत्राचा कळीकाळाला सुध्दा मोठा धाक वाटतो.या साठी मनाचा निश्चय करुन कंबर कसून नामजप करावा असे संत ज्ञानदेव सुचवतात. सत्वगुणी साधक सर्व सोडून विठ्ठल नामावळी जपतात त्या मुळे त्यांच्या देह मनाची शुध्दी होते व परमात्म तत्व निखळपणे समजते.बापरखुमादेविवरु हाच सर्व जीवांच्या अंतरीचा जिव्हाळा आहे असे संत ज्ञानेश्वर नि:संशयपणे स्पष्ट करतात.
'''अभंग 38'''
का रे स्फुंदतोसी। कां रे स्फुंदतोसी ।न भजतां विठ्ठलासी
नरकीं पडसी ।।1।।पुण्य पाप बाधा न पवसी गोविंदा ।
पावशील आपदा । स्मर परमानंदा ।।2।।पुण्य करिता
स्वर्ग । पाप करितां भोग । नाम जपतो सर्वांग होईल
पांडुरंग ।।3।।देहीं आत्मा जंव आहे। तव करुनियां पाहे।
अंतीं कोणी नोव्हे । धरी वैष्णवाची सोय ।।4।।जाईल हें आयुष्य । न सेवी विषयविष पडतील यमपाश वेगीं करी
।।5।।बापरखुमा देविवरु विठ्ठलीं । मन चरणींगोंवीं। हारपला देहभावीं।जालासे गोसावी एकरूप ।।6।।
'''भावार्थ ---'''
सदासर्वदा गर्वाने उन्मत होऊन विठ्ठलाच्या
भजन-किर्तनाला टाळल्यास नरकवास भोगावा लागेल असा
ईशारा देऊन संत ज्ञानेश्वर साधकाला सावध करून परमानंद विठ्ठलाचे स्मरण करण्यास सुचवतात.पुण्याने
स्वर्गवास व पापाने नरकवास भोगावा लागतो तर नामजपाने
प्रत्यक्ष पांडुरंगाचे स्वरुप प्राप्त होत असे नि:संशयपणे सांगतात.जो पर्यंत देहात चैतन्य आहे तो वरच विठ्ठलाची
जाले करुन घेणे श्क्य आहे कारण अंतकाळीं वैष्णवा शिवाय
कोणीही सोडवणारा नाही.आयुष्य नश्वर आहे ,ईंद्रियांचे विषय विषासारखे आहेत ,त्यां पासून अलग राहून परमेश्वर
चरणी मन गुंतवून जीवनाचे सार्थक केले पाहिजे.संत ज्ञानदेव स्वानुभवाने सांगतात की, विठ्ठलाचे चरणकमळी
मन एकरूप केल्याने देहभाव नाहीसा होऊन आपण परमात्म
स्वरूपच बनलो.
'''
अभंग---39'''
आरंभी आवडी आदरें आलों नाम । तेणे सकळ सिध्दी जगीं
जाले पूर्ण काम ।।1।।रामक्रुष्ण गोविंद गोपाळा।तूं माय माउली जिवीं जिव्हाळा ।।2।।तुझियेनि नामें सकळ संदेहो
फिटला । बापरखुमादविवरा श्रीविठ्ठला ।।3।।
'''भावार्थ---'''
आरंभी हरीचरित्रामुळे आदर निर्माण झाला,नंतर विठ्ठला विषयी विलक्षण प्रेमभाव मनांत जाग्रुत होऊन नामाविषयी ओढ वाटू लागली.अखंड नामस्मरणाने सकळ सिध्दी
प्राप्त झाल्या.असे सांगून संत ज्ञानदेव म्हणतात की,हा गोविंद,गोपाळ आपली माय माऊली ,जिवीचा जिव्हाळा
बनला आहे.बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठलाच्या नामजपामुळे
मनातील सर्व संशयांचे निराकरण झाले आहे.
'''अभंग---40'''
अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे।हरिनाम नाटे तें
बरवें।।1।।जें नाटे तें नाम चित्तीं ।रखुमादेविपती श्रीविठ्ठलाचें ।।2।।शरीर आटें संपत्ति आटे।हरिनाम
नाटे तें बरवे ।।3।।बापरखुमादेविवराचें नाम नाटे।
युगें गेली तरी उभा विटे ।।4।।
'''भावार्थ ---'''
अंड्यातून,गर्भातून,घामातून,पाण्यातून जन्म घेणाय्रा
या चारी खाणीतिल सर्व सजीव हे नश्वर आहेत.भगवंताचे
नाम मात्र चिरंतन,शाश्वत आहे .ते सतत चित्तात धारण
करावें . देह ,संपत्ति यांना नाश आहे,हरिनाम विनाशी
असून ,विठोबा युगांयुगापासून विटेवर उभा आहे.
अठ्ठाविसयुगांपासून विठोबा विटेवर उभा आहे असे संत वचनआहे.
'''अभंग---41'''
कर्म आणि धर्म आचरती जयालागीं ।साधक सिणले साधन साधितां अभागी ।।1।।गोड तुझे नाम विठोबा आवडतें मज।
दुजे विचारितां मना वाटतसे लाज ।।2।। भुक्त्ति आणि मुक्त्ति
नामापासीं या प्रत्यक्ष । चारह्री वेद साही शास्त्रें देताती साक्ष ।।3।।काया वाचा चित्त चरणीं ठेविलेंसे गाहाण ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ।।4।।
'''भावार्थ---'''
परमात्म्याच्या प्राप्तिसाठी साधक जप, तप ,व्रत,वैकल्य,
यज्ञ याग दान धर्म असें अनेक मार्ग अनुसरतात.ही साधने साधतांना हे साधक थकून जातात.प्रत्यक्षांत निराशाच पदरी पडते.या अनुभवावरुन संत ज्ञानेश्वर सांगतात कीं,
विठोबाचे गोड नाम आपणास अतिशय आवडते व त्या
शिवाय इतर मार्गाचा विचार करण्याची सुध्दा लाज वाटते.
नामसाधनेमुळे साधकाला भक्ति व मुक्ति प्राप्त होतात याची
चारी वेद व सहा शास्त्रे साक्ष देतात.बापरखुमादेविवरा
विठ्ठलाची शपथ घेऊन ज्ञानदेव सांगतात कीं, आपण आपला देह,मन,वाणी विठ्ठलचरणी अर्पण केले आहे.
'''अभंग ---42'''
जें शंभूने धरिलें मानसीं । तेंचि उपदेशिलें गिरिजेसी ।।1।।नाम बरवें बरवें । निज मानसी धरावें ।।2।।गंगोदकाहुनी निकें । गोडी अमृत जालें फिके ।।3।।
शीतळ चंदनाहूनी वरतें । सुंदर सोनियाहुनी वरतें ।।4।।
भुक्त्ति मुक्त्तिदायक । भवबंधमोचक ।।5।।बापरखुमादेविवरें। सुलभ नाम दिधलें सोपारें ।।6।।
'''भावार्थ ---'''
समुद्र मंथनातून निघालेले जहर प्राशन केल्यानंतर त्याचे
उपशमन करण्यासाठी शिवशंकराने श्रीहरीचे गोड नाम
कंठात धारण कले याच नामाचा त्यांनी पार्वतीस उपदेश
केला.श्रीहरीचे नाम गंगेच्या पाण्यापेक्षा पवित्र , अम्रुता पेक्षा
गोड , चंदनाहून शीतल व सोन्याहूनही सुंदर आहे.श्रीहरीचे
नाम भुक्ति व मुक्ति देणारे व संसारबंधनातून मुक्त करणारे
आहे.असे सुंदर सुलभ नाम रखुमादेविवराने भक्तांना दिले.
'''अभंग ---43'''
सकळ नेणोनियां आन । एक विठ्ठलुची जाण ।।1।।पुढती पुढती मन ।एक।विठ्ठलुची जाण ।।2।।हेंचि गुरुगम्याची खूण । एकविठ्ठलुची जाण ।।3।।बुझसी तरी बुझ निर्वाण।एक विठ्ठलुची जाण ।।4।।हेचि भक्ति हेंचि ज्ञान।
एक विठ्ठलुची जाण ।।5।।बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण।एकविठ्ठलुचि जाण ।।6।।
'''भावार्थ ---'''
जे जाणून घेतल्याने सर्व कांही जाणलें जाते असे विठ्ठल हे
तत्व आहे.तेव्हां इतर सर्व कांही सोडून एका विठ्ठलाला
जाणून घ्यावे असे संत ज्ञानेश्वर सांगतात.हीच गुरुतत्व
जाणून घेण्याची खूण आहे.समजून घेऊ शकत असशील तर
समजून घ्यावे कीं,विठ्ठलपद हेंच मोक्षपद असून तेच खरें भक्ति व ज्ञान आहे.बापरखुमादेविवराची शपथ घेऊन संत
ज्ञानेश्वर सांगतात कीं,एका विठ्ठलालाच जाणून घ्यावें.
'''अभंग ---44'''
जप तप अनुष्ठान । नित्य आमुचें रामधन । रामक्रुष्ण नारायण । हाचि जिव्हाळा सर्वदा ।।1।।जयाशी अम्रुत घट।
रामक्रुष्ण घडघडाट । हेचि पूर्वजांची वाट ।सर्व जिवाशी तारक ।।2।।गोविंद गोविंद राम ।सर्व साधिलें सुगम ।नलगे तीं तपें उत्तम ।रामक्रुष्ण पुरे आम्हा ।।3।।ज्ञानदेवी
स्नान ध्यान । राम राम नारायण । इतकेंचि पुरे अनुष्ठान।
हेंचि जीवन शिवाचें ।।4।।
'''भावार्थ---'''
रामनाम नित्य जपणे हेंच आमुचे जप तप अनुष्ठान असून
रामक्रुष्ण नारायण हे आमच्या अंतरिचे दैवत आहे असे संत
ज्ञानदेव म्हणतात.रामक्रुष्णाच्या नामाचा गजर ही पूर्वजांनी घालून दिलेली वहिवाट असून सर्व जिवांना तारणारी आहे.गोविंद गोविंद राम या जप साधनेने सर्व कांही सिध्दिस
गेले आहे.राम राम नारायण या जपाचे अनुष्ठान हेच आमुचे संध्यास्नान व ध्यान आहे असून हें इतकेचि अनुष्ठान
पुरेसे आहे.हें च शिवशंकराचे सुध्दा अनुष्ठान होय असे संत
ज्ञानेश्वर सांगतात.
'''अभंग ---45'''
आजि संसार सुफळ जाला गे माये ।देखियेले पाय
विठोबाचे ।।1।।तो मज व्हावा तो मज व्हावा । वेळोंवेळा
व्हावा पांडुरंग ।।2।।बापरखुमादेविवरु न विसंबे सर्वथा।
निवृत्तिनें तत्वतां सांगितलें ।।3।।
'''भावार्थ ---'''
श्री विठ्ठलाच्या पदकमलांचे दर्शन झाले आणि सर्व संसार
सफल झाला .या दर्शनाचा लाभ परत परत घडावा तो पांडुरंग सदा चित्ती वसावा.बापरखुमादेविवर पांडुरंगाला
क्षणभरही विसंबू नये असे सद्गुरु निवृत्तिनाथांनी आपणास आवर्जुन सांगितले असे संत ज्ञानदेव म्हणतात.
'''अभंग ---46'''
अमोलिक रत्न जोडलें रे तुज ।कां रे ब्रह्मबीज
नोळखिसी?।।1।।न बुडे न कळे न भीये चोरा । ते वस्तु
चतुरा सेविजेसु ।।2।।ज्ञानदेवो म्हणे अविनाश जोडलें।
आणुनी ठेविलें गुरुमुखीं ।।3।।
'''भावार्थ---'''
प्रत्यक्ष परब्रह्माचा अंश असलेले मानवी देहरुपी अमोलिक
रत्न मिळाले असूनही हे ब्रह्मबीज जो परमात्मा कां ओळखत नाहीस असा प्रश्न विचारून संत ज्ञानेश्वर म्हणतात कीं,सद्गुरुंना शरण जावून हे ब्रहमज्ञान प्राप्त केले
पाहिजे.ते आत्मज्ञान अगोचर असून बोध होण्यास अवघड आहे चतुराईने ते मिळवावे लागेल.परंतू या आत्मज्ञानास
चोराचे अथवा पाण्याचे भय नाही.असे आत्मज्ञान गुरुमुखाने पुढे आणून ठेवल्यानें आपणास प्राप्त झालें असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.
'''अभंग---47'''
परिमळाची धांव भ्रमर वोढी ।तैसी तुझी गोडी लागो
मज ।।1। अविट गे माय विटेना । जवळी आहे परी
भेटेना ।।2।। तृषा लागलीया जीवनातें ओढी । तैसी तुझी गोडी लागे या जिवा ।।3 ।।बापरखुमादेविवरा विठ्ठली आवडी। गोडियासी गोडी मिळोन गेली ।।4।।
'''भावार्थ---'''
फुलांचा सुगंध आसमंतात पसरतो व भ्रमराला आपल्याकडे
खेचतो.तशी विठ्ठलाच्या स्वरुपाची ओढ आपल्याला लागावी अशी संत ज्ञानेश्वर आळवणी करतात.परब्रह्म स्वरूप अविट असून त्या स्वरुपाला मन कधी विटत नाही
आणि अगदी जवळ असूनही भेटत नाही.तहान लागल्यावर
पाण्यासाठी जिवाची जशी तळमळ होते तशी विठोबाच्या
स्वरूपाची ओढ लागावी .परमात्म्य स्वरुपांत जिवात्म्याचे
सौख्य एकरुप व्हावे अशी अंतरिक ईच्छा संत ज्ञानेश्वर
या अभंगात व्यत्त करतात.
'''अभंग ---48'''
पडलें दूर देशीं मज आठवे मानसीं ।नको नको हा वियोग
कष्ट होताती जिवासी ।।1।।दिनु तैसी रजनी मज जालिये वो माये ।अवस्था लावुनी गेला अझुनी कां न ये।।2।।
गरुडवाहना ,गंभिरा येई गा दातारा । बापरखुमादेविवरा श्रीविठ्ठला ।।3।।
'''भावार्थ ---'''
परमात्म स्वरुपा पासून दूर गेल्यानें सतत आठव येतो,या
वियोगानें मनाला अतिशय कष्ट होतात.मनाची करुण अवस्था झाली आहे.या अवस्थेतून सोडवणूक करण्यासाठी
संत ज्ञानेश्वर श्रीवठ्ठलाला गरुडवाहना, गंभिरा, दातारा
अशी साद घालून अजून कां येत नाही असे विचारतात.
'''अभंग ---49'''
कवणाची चाड आतां मज नाहीं ।जडलों तुझ्या पायीं
निश्चयेंची ।।1।।देह जावो राहो नाहीच संदेहो । न करी
निग्रहो कासयाचा ।।2।।बहुत श्रमलों साधन करितां ।
विश्रांति तत्वतां न होयची ।।3।।तुज वांचोनियां कवणां सांगावें ।कवणां पुसावें अनुभवसुख ।।4।।माता पिता सखा
सर्वस्व तूं कीर ।म्हणे ज्ञानदेव निव्रुतिशी ।।5।।
'''भावार्थ ---'''
या अभंगात संत ज्ञानेश्वर आपले सद्गुरु निव्रुत्तिनाथांना
सांगतात कीं, आपणास आतां कुणाकडूनही कसलिही ईच्छा
नाही.निश्चयपूर्वक गुरुचरणांशी जडलो आहे.देह जावो अथवा राहो या विषयीं कोणतिही आसक्ति नाही, कसलाच अट्टाहास नाही.साधना करुन खूप थकून गेलो असून
मनाला विश्रांति नाही. या गोष्टी एका सद्गुरुंशिवाय कोणाला सांगतां येत नाही,अनुभवसुखा विषयी सद्गुरुंशिवाय कोणाशीं हितगूज करणार? कारण एक सद्गुरुच आपले माता ,पिता, सखा सर्वस्व आहेत.
'''अभंग ---50'''
अग्नीच्या पाठारीं पिके जरी पीक । तरी ज्ञानी सुखदु:ख भोगतील ।।1।।काळोखामाजीं जैसें शून्य हारपे । मायोपाधी लोपे तया ज्ञानी ।।2।। नक्षत्राच्या तेजें जरी इंदु पळे ।तरी ज्ञानी विकळे पुण्यपाप ।।3।।बापरखुमादेविवर विठ्ठलु राया । घोटूनिया माया राहियेला ।।4।।
'''भावार्थ---'''
धगधगित अग्नीच्या पठारावर जसे पीक येणे शक्य नाही
तसेच ज्ञानी माणसाला सुखदु:ख भोगावी लागत नाही
जशी काळोखांत आकाशाची पोकळी लोप पावते,तशी ज्ञानी
पुरुषाची मायारुपी उपाधी लोप पावतें.जर नक्षत्रांच्या
तेजाने चंद्र लोपून जाऊ शकेल तर ज्ञानी व्यक्तिला पाप पुण्याची चिंता ग्रासू शकेल. बापरखुमादेविवरु विठ्ठल
हा मायातीत ,सर्वज्ञानी आहे असे संत ज्ञानेश्वर म्हणतात.
'''अभंग ---51'''
गगनाहूनी व्यापक वायुहूनि चालक ।अग्नीहूनी दाहक आन
नसे ।।1।।ब्रह्म परिपूर्ण तोच सनातन ।स्वये आनंदघन आन
नसे।।2।। दृष्यहूनी गोचर इहिहूनि पर । गुरुवीण ज्ञानेश्वर
आन नसे ।।3।।
'''भावार्थ ---'''
सामान्य माणसाला आकाश सर्वव्यापी वाटतें.ब्रह्म त्याहूनही
व्यापक असून गगनाला व्यापून टाकते.वायु सर्व सजीवांच्य
चलनवलनाचा नियंत्रक आहे पण ब्रह्म वायूचाही चालक आहे.अग्नीची दाहकता ब्रह्मरूपाहून वेगळी नाही.ब्रह्म परिपूर्ण ,अनादी,अनंत असून आनंदघन आहे.ब्रह्मरुपासारखे अन्य कांहीच नाही ,ते दृष्य वस्तुच्या पलिकडे आहे.संत ज्ञानेश्वर म्हणतात कीं,आपणही ब्रह्मरूप
सद्गुरू निव्रुतिनाथापेक्षा वेगळे नाही.
'''अभंग---52'''
मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति । तरीच विरक्ती
प्रगटेल।।1।। विरक्ति विषयीं होतांची विचार ।नित्य हे नश्वर
ओळखती ।।2।। तेव्हां आत्मज्ञान अनुभव होय। अविद्यत्व
जाय जीवरुप ।।3।।शांति क्षमा दया तिष्ठती सहज । न दिसे दृष्य काज जगामाजीं ।।4।।गुरुक्रुपा द्वारें लाहिजे पैं सिध्दी । बोलिला त्रिशुद्धि ज्ञानेश्वर ।।5।।
'''भावार्थ ---'''
मोक्षाची इच्छा असणार्यांनी हरीची भक्ति करावी,भक्तिमुळें
चित्त शुध्द होऊन विरत्ती निर्माण होईल.त्या मुळे नित्यानित्य
विवेक करण्याची सवय होईल. देहबुध्दी कमी होत जाऊन
आत्मबुध्दीचा विकास होईल.आपले मानवी स्वरुप मुलत:
देह नसून आत्मा आहे याचा बोध होईल.अविद्येचा लोप होईल.दिसणारे व भासणारे सर्व द्रुष्य विश्व नश्वर आहे याची खूण पटेल.दया क्षमा शांती मनोमंदिराच्या पुढे उभ्या ठाकतील.गुरुक्रुपेमुळे या अपूर्व सिध्दी प्राप्त होतील अशा
त्रिविध प्रकारच्या त्रिशुध्दी संत ज्ञानेश्वरांनी याअभंगात
सांगितल्या आहेत.
'''अभंग ---53'''
मरण न येतां सावधान व्हा रे । शोधुनी पावा रे
निजवस्तू ।।1।।अंतकाळीं जरी करावें साधन ।म्हणतां नागवण आली तूम्हां ।।2।।नाशिवंत देह मानाल शाश्वत।
तरी यमदूत ताडतील ।।3।।काळाचे खाजुके जाणिजे कीं
काय। धरुं नको माया सर्वथैव ।।4।।अमोलिक प्राप्ति होत
आहे तुज ।धरुनियां लाज हित करीं ।।5।।मागुती न मिळे
जोडलें अवचट । सायुज्याचा पाट बांधुनी घेई ।।6।।ज्ञानदेव
म्हणे विचारा मी कोण । ना तरी पाषाण होऊनी राहा।।7।।
'''भावार्थ---'''
मृत्युने गाठण्याच्या आधीच सावध होऊन आत्मवस्तुचा
शोध घ्यावा असे संत ज्ञानदेव या अभंगात सांगतात कारण
अंतकाळी रामनाम हे आत्मप्राप्तिचे साधन करू असे म्हटले
तर त्या वेळीं मुखांत नाम न आल्यास फसवणूक होण्याचा धोका आहे.हा नाशवंत देह शाश्वत मानून त्याचा मोह धरल्यास यमदूतां कडून ताडलें जाऊ शकाल.यमाचा घाला
केव्हांही पडू शकेल. मोक्ष-मुक्ती ही अमोलिक वस्तु असून
अनित्य वस्तुचा त्याग करावा व मानवी देहाचे सार्थक करून घ्यावें.कारण हा देह परत परत मिळणारा नाही,या जन्मांतच सायुज्य मुक्ती साधून घेण्याची सोय आहे.आतांच
आपण कोण आहोत आणि आपल्या मनुष्य देहाचे प्रयोजन
काय याचा विचार न केल्यास जडदेहांत अनंत काळापर्यंत
राहावें लागेल.
'''अभंग---54'''
गुरूज्ञान नाहीं ज्यासी । तरणोपाय नाहीं त्याशी ।तो नावडे
ऋषीकेशी । व्यर्थ जन्मासी तो आला.।।1।।देव धर्म नेणें कांहीं। घरी प्रपंचाची सोई ।त्या कोठेंही थारा नाही ।हें वेद
बोलिलासे ।।2।।क्रुष्णकथा जो नायके ।
'''भावार्थ ---'''
संत ज्ञानेश्वर या अभंगात म्हणतात कीं, ज्याच्याकडे
गुरुज्ञान नाही तो भगवंताला आवडत नाही. कारण
संसार सागर तरुन जाण्यासाठी गुरुक्रुपेची अत्यंत
जरुरी असते.जो देव ,धर्म जाणत नाही,संसाराची
चिंता नाही त्याला कोठेही विसाव्याचे ठिकाण नाहीं
असे वेदांत सांगितले आहे.ज्याला
क्रुष्णकथेची गोडी
नाही ,रामनाम मुखाने जपत नाही,त्याला
जन्मजन्मांतरी कोटी दु:खें सोसावी लागतात.जन्म
मरणाचा फेरा चुकत नाही.संत ज्ञानदेवांनी वेद,
उपनिषदांचा सखोल अभ्यास करुन ,संस्क्रुत
भाषेच्या पिंजर्यात अडकलेलें वैदिक ज्ञान मोकळे
केले व सामान्य लोकांना ज्ञानाची ,मोक्षाची कवाडं
उघडी करुन दिली.सर्व पितरांसहित सर्वांचे
भवपाश तोडलें.
'''अभंग---55'''
दुडीवर दुडी गौळणी साते निघाली ।गौळणी
गोरसु म्हणों विसरली ।।1।।गोविंद घ्या वो दामोदर
घ्या वो ।जव तव बोलती मथुरेच्या वो ।।2 ।।गोविंद
गोरसु एकचि नांवा ।गोरसु विकूं आलें तुमच्या
गावा ।।3।।बापरखुमादेविवर विठ्ठलेंसी भेटी ।आपले संवसाटी करुनी ठेली ।।4।।
'''भावार्थ ---'''
दूधाच्या हंड्या एकावर एक ठेवून मथुरेच्या बाजारांत
गेलेली गौळण हरीनादांत इतकी बुडून गेली कीं,
दूध घ्या दूध असं म्हणायचे विसरुन गोविंद घ्या
दामोदर घ्या असा हाकारा करु लागली.तिचे हे बोल
ऐकून इतर गौळणींना अचंबा वाटला. त्यांची ही
प्रतिक्रिया पाहून ही गवळण त्यांच्यापासून दूर
निघून गेली आणि आपल्या विचारांत दंग झाली.
हे सर्व विश्व एकाच परमेश्वरी रंगाने रंगले आहे.मथुरेचा
बाजार,दूध विकणारी गवळण आणि गोरस सर्व
एकाच परमेश्वराची रुपें आहेत.संत ज्ञानेश्वर
म्हणतात रखुमादेविवराची भेट झाली असतां
भेट घेणारा परमात्म स्वरुप होतो.
[[वर्ग:संत ज्ञानेश्वर]]
5na9r1bsvtdhe5dsped3jygypy31346
रामदासांची पदे
0
3148
13172
7173
2022-08-20T14:42:31Z
QueerEcofeminist
1879
QueerEcofeminist ने मागे पुनर्निर्देशन न ठेवता लेख [[रामदासांचे पदे]] वरुन [[रामदासांची पदे]] ला हलविला: शुद्धलेखन
wikitext
text/x-wiki
==पद==
'''पदे---१'''
(राग -खमाज, ताल-धुमाळी )
मंगळाचरण आरंभिला ।।
सरळशुंडा,विघ्नवितंडा,चंड प्रचंडा सुबाहु दंडा ।
छेदुनि पिंडा, करूनि खंडा,वक्रतुंडा, याच पदीं
घालुनि मुरकुंडा ।।
सगुणमंदिरीं,दिव्यसुंदरी,करी किन्नरी,करी तनरी ।
रागोध्दारी,विद्यासागरी परोपकारी,नमुं नमुं ते
ब्रह्मकुमारी ।।
अनाथनाथा, मीपणवार्ता, त्रासककर्ता,अमीव गर्ता ।
पुरुनि तार्ता, माविकवार्ता, सुख दाविता, देवदास
गुरु स्वमीसमर्था ।।
'''भावार्थ---'''
हे पद मंगला चरणाचे गणेशाचे पद आहे.सरळ सोंड व वक्रतुंड असा गणेश ,त्याच्या बलदंड बाहुमध्यें दंडा असून तो अहंकाराचा पिंड छेदून त्याचे खंडन कळतो.गणेश ही देवता सर्व प्रकारच्या विघ्नांचा नाश करणारी आहे,असे संत रामदास या मंगलाचरणाच्या पदांत म्हणतात.
'''पद---२'''
गणपती गणराज धुंडिराज महाराज ।
चिंतामणी मोरेश्वर याविण नाहीं काज ।।
अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार ।
ब्रह्माविष्णुमहेश हे तरी तुझेच अवतार ।।
त्रिगुणे तूं गुणातीत नामरूप विरहित ।
पुरुष नाम प्रकृतींत नाहीं अंत हा ।।
सच्चिनंद देवा आदि। अंत तुलाच ठावा ।
दास म्हणे वरदभावा। कृपादृष्टी हा ।।
'''भावार्थ ----'''
गणपती हा संघनायक असून त्याला धुंडिराज महाराज असे संबोधन आहे,हा मोरेश्वर चिंतामणी (इच्छिले फळ देणारा )आहे. या चिंतामणीच्या कृपेशिवाय कोणतेही काम सफल होत नाही. ब्रह्मा (अकार) विष्णु (उकार) महेश (मकार) हे गणेशाचेच अवतार आहेत.ॐ कार हे गणेशाचे स्वरुप असून त्याची सोंड अनिवार आहे. गणपती सत्व, रज, तम यां गुणांच्या अतीत (पलिकडे)आहे,तसेच तो नामरूप विरहित आहे. सत्,चित् आनंदमय आहे.पुरुष व प्रकृतींत अनादी,अनंतआहे.संतरामदास म्हणतात,आदि आणि अंत जाणणारा ,कृपाळु,वरदविनायक आहे.
'''पद---३'''
तांडव नृत्य करी, गजानन तांडवनृत्य करी ।।
धिमि कीटी धिमि कीटी मृदंग वाजे । ब्रह्मा ताल धरी ।।
तेहतीस कोटी सभा घनदाटी । मध्यें शिव गौरी ।।
रामीरामदास सदोदित । शोभे चंद्र शिरीं ।।
'''भावार्थ---'''
या पदांत संत रामदास गजाननाच्या तांडवनृत्याचे वर्णन करीत आहेत. तेहतीस कोटी देवांच्या घनदाट सभेंत मध्यभागी शिवशंकर आणि पार्वती विराजमान आहेत. शंकराच्या मस्तकावर सदोदित चंद्रमा शोभत आहे. धिम कीटी धिमि कीटी या मृदंगाच्या तालावर ब्रह्मदेवांनी ताल धरला आहे आणि गजानन तांडवनृत्य करीत आहे .
'''पद---४'''
(राग -कानडा, ताल --सवारी, त्रिताल )
प्रगटत नटवेषे गणाधीश । प्रगटत नटवेषें ।।
ठमकत ठमकत झमकत झमकत । हरुषत शिव तोषें ।।
धिधि किट धिधि किट थोंगित थोंरिकट । परिसीत सुखलेश।।
'''भावार्थ ---'''
घनदाट देवसभेंत गजानन नटवेषांत प्रगट होतो.ठुमकत ठुमकत चालीने प्रवेश करणारा गजानन स्वतेजाने चमकत येतो तेव्हां शिवशंकर अत्यंत संतोषाने हर्षभरीत होतात. गजाननाच्या पदांचा धिधि किट नाद सुखानें श्रवण करतात.
'''श्री शारदा---पद ५---'''
(राग --काफी, ताल ---दादरा। )
वंदा वंदा रे शारदा । शारदादेवी साधकासी वरदा ।।
परा पश्यंती मध्यमा प्रसन्न। होते उत्तमा आणि मध्यमा ।
त्रैलोकीं जाणतीकळा ।। तयेवीण कळाचि होती विकळा ।।
दास म्हणे प्रचिती । सकळ जनीं देतसे जगज्योती ।।
'''भावार्थ ----'''
शारदादेवी साधकांना वरदान देणारी देवता आहे.वाणी वैखरी,मध्यमा, परा, पश्यंती या चार रुपांत प्रकट होते. तिन्ही लोकांत ती जाणतीकळा म्हणुन प्रसिध्द आहे,तिच्याशिवाय कलेचे स्वरुप बदलून ती विकळा होते असे सांगून संत रामदास म्हणतात शारदादेवी सर्व लोकांना ज्ञानाचा प्रकाश देते,यावरुन तिची प्रचिती येते. ज्ञानरुप शारदेला वंदन करुन उपासना केल्यास आपली उत्तमा आणि मध्यमा वाणी प्रसन्न होते.
'''पद---6'''
(चाल --भजनी )
ब्रह्मकुमारी शारदा ते वरदा । ब्रह्मकुमारी ।।
साधकाचे अभ्यंतरी ते शारदा ।।
चतुर्विधा वागेश्वरी ते शारदा ।।
स्फूर्तिरूपे प्रकाशली ते शारदा ।।
वाचारूपे अनुवादली ते शारदा। ।।
रामदासीं कार्यसिध्दि ते शरदा। ।।
चित्तीं सहसमाधी ते शारदा ।।
'''भावार्थ ---'''
शारदादेवी ब्रह्मदेवाची कन्या ब्रह्मकुमारी असून साधकांना वर देणारी आहे. शारदेचे वास्तव्य साधकांच्या हृदयांत असते. ही देवता चार प्रकारच्या वाणीची देवता असल्यानें तिला वागेश्वरी म्हणतात.ती साधकांच्या मनांत स्फूर्तिरूपाने प्रकाशतें आणि वाचारुपाने प्रगट होते. संत रामदास म्हणतात,आपल्या कार्याची सिध्दीदेवता ही शारदा असून ती चित्तामध्ये सहज समाधी लावते.
'''पद--7'''
(चाल--साधुसंता मागणे )
कथाकथनी वंदिली सरस्वती । कथाकथनीं ।।
हंसवहनी वेदमाता। चतराननी दुहिता ।।
शब्दब्रह्माची निजलता । कल्पतरु वाग्देवता ।।
ब्ह्मविद्येची निजखाणी । रामदासाची जननी ।।
'''भावार्थ ---'''
शारदादेवी ही वेदांची जननी असून ब्रह्मदेवाची दुहिता (कन्या)आहे. या देवतेचे वाहन हंस असून शब्दब्रह्माची लता (वेली) आहे. ही वाग्देवता इच्छिलेलें मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरु असून ब्रह्मविद्येचे उगमस्थान आहे. संत रामदास म्हणतात, शारदादेवी आपली माता असून अनेक कथांमधून तिला वंदन केले आहे.
'''पद--8'''
(राग--भूप, ताल--त्रिताल )
नमिन मी गायका । गायका वरदायका
विणापुस्तकधारिणी । अनेकसुखकारिणी ।
अघे दुरितहारिणी । त्रिभुवनतारिणी ।।
चत्वार वाचा बोलवी । सकळजन चालवी ।
त्रिभुवन हालवी । निरंजन पालवी ।।
दास म्हणे। अंतरीं । अंतरी जगदांतरीं ।
निगमगुज वीवरी । आपुलें हित तें करी ।।
'''भावार्थ---'''
हातांमध्यें विणा व पुस्तक धारण करणारी,अनेक प्रकारच्या पापांचे व दुष्टाचारांचे परिमार्जन करून तिन्हीं भुवनांना तारणारी,वैखरी,मध्यमा,पश्यंती परा या चारही वाणींना प्रकट करणारी आणि सर्व लोकांना जागवणारी,त्रिभुवन हालविण्याची शक्ति असलेली ही शारदादेवी वंदनीय आहे. संत रामदास म्हणतात, ही देवता आपल्या अंतरी नांदते, तसेच सर्व जगताच्या अंतरांत वास्तव्य करुन राहते.वेदांचे रहस्य स्पष्ट करून त्यांचे विवरण करते आणि आपुले हित करते.
'''पद--9'''
(राग--काफी, ताल--धुमाळी )
एक तो गुरु दुसरा सद्गुरु
सद्गुरुकृपेविचुनि न कळे ज्ञानविचारू ।।
पारखी नेणती ज्ञानी ओळखती ।
गुरु केलि परि ते नाहीं आत्मप्रचिति ।।
म्हणोनि वेगळा सद्गुरु निराळा ।
लक्षांमध्यें कोणी एक साधु विरळा ।।
सद्य प्रचिति नसतां विपत्ति ।
रामदास म्हणे कैसी होईल रे गति ।।
'''भावार्थ ---'''
संत रामदासांच्या मतें गुरु व सद्गुरु या मध्यें मूलत:भेद आहे.सद्गुरु शिवाय ज्ञानाचा खरा विचार कळणार नाही. गुरु केलातरी साधकाला आत्मप्रचीति होतनाही,आत्मज्ञान मिळत नाही.आपण देह नसून आत्मतत्व आहोत हे सद्गुरु शिवाय अनुभवास येत नाही म्हणुन सद्गुरु इतर गुरुंपेक्षा निराळा आहे.लक्ष लक्ष साधुंमधून एखादाच सद्गुरु असतो, त्यांची प्रचिती न आल्यास साधक विपत्ति मध्ये सांपडतो.
सर्वार्थानें बुडतो.अशा सद्गुरुला खरा पारखी,ज्ञानी ओळखतो.सद्गुरु शिवाय सद्गती प्राप्त होणार नाही असे संत रामदास निक्षून सांगतात.
'''पद---10'''
(राग--कल्याण, ताल--त्रिताल )
सद्गुरु लवकर नेती पार ।।
थोर भयंकर दुस्तर जो अति । हा भवसिंधु पार ।।
षड्वैय्रादिक क्रूर महामीन । त्रासक हे अनिवार ।।
घाबरला मनिं तीव्र मुमुक्षु । प्रार्थित वारंवार ।।
अनन्यशरण दास दयाघन । दीनजना आधार ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास या पदांत सांगतात, हा संसार रुपी सागर पार करून जाण्यास अत्यंत कठिण आहे कारण या संसारसागरांत लोभ,क्रोध,मद,मत्सर,मोह,दंभ असे सहा प्रकारचे अत्यंत क्रूर असे भयंकर मासे आहेत,जे अतिशय त्रासदायक आहेत.यामुळे मोक्षाची इच्छा करणारा साधक घाबरून जातो व सद्गुरुला शरण जावून वारंवार प्रार्थना करतो,अशा वेळी देयेचा प्रत्यक्ष मेघ असा सद्गुरु त्या अनन्यशरण अशा भक्तास आधार देवून संसारसागरातून पार करतो.
'''पद---11'''
(चाल--श्रीगुरूंचें चरणकंज )
तुजविण गुरुराज आज कोण प्रतीपाळी ।
मायबाप कामा न ये कोणीं अंतकाळीं ।।
जळाविण तळमळित जसा मीन शुष्क डोहीं ।
तुजविण मज वाटे तसे धांव लवलाही ।।
चकोरचंद्रन्याय जसा गाय माय बाळा ।
पाडसासी रिणी जसी तेविं तूं कृपाळा ।।
रामदास धरुनि आस। पाहे वास दिवसरात ।
खास करिल काळ ग्रास, ध्यास हा मनासी ।।
'''भावार्थ ---'''
संत रामदास या पदांत श्रीरामाचा धावा करीत आहेत.पाण्यावाचून कोरड्या असलेल्या शुष्क डोहांत पडलेला मासा जसा तळमळतो तसा अंतकाळी मायबाप सुध्दा मदतीस येत नसल्याने जीव कासाविस होतो. चकोर जशी चंद्राची, गाय वासराची किंवा आई बाळाची, किंवा हरिणी जशी पाडसाची आतुरतेनें वाट पहाते तसा जीव कृपाळु सद्गुरुची वाट पहातो.संत रामदास मनामधे आस धरून रात्रंदिवस श्रीरामाची वाट बघत आहेत.काळ आपला घास करणार हा एकच ध्यास लागला आहे. सद्गुरु श्री रामाशिवाय कोणिही प्रतीपाळ करणार नाही अशी त्यांची दृढ श्रध्दा आहे.
'''पद---12'''
(राग-- वसंतभैरव, ताल--त्रिताल )
गुरुदातारें दातारें । अभिनव कैसें केलें ।।
एकचि वचन न बोलत बोलुनि । मनास विलया नेलें ।।
भूतसंगकृत नश्वर ओझें । निजबोधे उतरिलें ।।
दास म्हणे मज मीपणाविरहित । निजपदीं नांदविलें
'''भावार्थ---'''
एकही शब्द न बोलता केवळ नजरेच्या दृष्टीक्षेपातून गुरुमाउलीने जो बोध केला त्यामुळे मन या कल्पनेचा पूर्णपणे निरास झाला. पंचमहाभूते आणि ईंद्रिये यांच्या संगामुळे निर्माण झालेले नश्वरतेचे ओझे सद्गुरांच्या सान्निध्याने उतरलें. संत रामदास म्हणतात अत्यंत उदारपणे सद्गुरुंनी आपणास त्यांच्या चरणांशी आश्रय दिला.आपला अहंकार पूर्णपणे विलयास नेण्याचे अभिनव कार्य केले.
'''पद --13'''
अपराधी आहे मोठा । मारणें कृपेचा सोटा ।।
गुरुराज सुखाचे कंद । नेणुनि केला हा निजानंद ।
तेणें पावलों मी बंध । जालो निंद्य सर्वस्वीं ।।
तारीं तारीं सद्गुरुराया । वारीं माझे तापत्रया ।
तुझे पाय काशी गया । आहे मजला सर्वस्वी ।।
आतां अंत पहासी काय । तूंचि माझा बापमाय ।
रामदास तुझे पाय । वारंवार वंदितो ।।
'''भावार्थ---'''
या पदांत संत रामदास स्वता:ला अपराधी मानून सद्गुरुंनी आपल्याला कृपेचा सोटा मारून शिक्षा करावी अशी विनंती करीत आहेत. गुरुराज सुखाचे कंद असूनही त्याची जाणिव ठेवली नाही,आपल्या मनाप्रमाणे वागल्यामुळें बंधनात पडलो आणि जगांत निंद्य ठरलो असे सागून गुरुमाऊलीने आपले आध्यात्मिक,आधिभौतिक,आधिदैविक तापापासून मुक्तता करून आपल्याला भवबंधनातून सोडवावें अशी विनंती करतात.अत्यंत काकुळतीला येऊन ते गुरुरायाचे चरणकमल हे आपणासाठी काशी,गया या तीर्थस्थानाप्रमाणे पवित्र आहेत असे मानून गुरुचरणांना वारंवार वंदन करतात.
'''पद ---14'''
(राग--देस, ताल--धुमाळी )
त्रिविध तापहारक हे गुरुपाव ।
भवसिंधूसी तारक हे। गुरुपाय ।।
स्वत्मसुखाचें बीज हे गुरुपाय ।
ज्ञानाचें निजगुज हे गुरुपाय ।।
भक्तिपंथासि लाविती हे गुरुपाय ।
नयनी श्रीराम दाविती हे गुरुपाय।।
सहज शांतीचें आगर हे गुरुपाय ।
पूर्णकृपेचे सागर हे गुरुपाय ।।
रामदासाचे जीवन हे गुरुपाय ।
सकळ जीवांसी पावन हे गुरुपाय ।।
'''भावार्थ---'''
या पदांत संत रामदास गुरु महात्म्य सांगत आहेत.गुरुपद तिन्ही प्रकारचे (आध्यात्मिक,आधिभौतिक,आधिदैविक) ताप हरण करणारे, आत्मसुखाचे बीज व आत्मज्ञानाचे रहस्य स्पष्ट करून सांगणारे आहेत.साधकाला भक्तिपंथाला लावून, नयनांना श्रीरामाचे प्रत्यक्ष घडवून देण्याचे सामर्थ्य असलेले शांतीचे आगर आहेत. पूर्णकृपेचे सागर आहेत. सर्व जीवांना पावन करणारे श्रीरामाचे चरणकमळ रामदासांचे जीवन आहेत.
'''पद---15'''
(राग भैरव, ताल-धुमाळी )
रंगा रे रंगी रंगा रे ।।
आपुले हित करणें जेहीं । आवडी धरावी संतसंगा रे ।।
श्रवण मनन ध्यास धरावा ।। कथा पावन पापभंगा रे ।।
दास म्हणे कथानिरूपण । संगचि करी नि:संगा रे ।।
'''भावार्थ---'''
साधकाला आपले हित करायचे असेल तर त्याने संतांची संगत धरावी. धर्मग्रंथाचे श्रवण,मनन करुन त्यांचा सतत ध्यास धरावा. पुराणातील कथा पापांचा नाश करून मनाला पावन करतात.मनाला नश्वर ईंद्रिय सुखापासून सोडवून नि:संग बनवण्याचे काम कथानिरूपणाने साध्य होतें.
'''पद--16'''
(राग--मारू, ताल--धुमाळी)
देव कळला। न जाय । संतसंगेवीण काय ।।
स्वप्नभराने वेगतिरानें । कैसेनि होय उपाय ।।
वैद्य पहातो औषध घेतो प्रचितीवीण अपाय ।।
कितिक आले कित्तेक गेले । देव ऋष रायेराय ।।
पाहेल। तो तो जाणेल तो तो । दास देवगुण। गाय ।।
'''भावार्थ----'''
या पदांत संत रामदास म्हणतात, संतसंगती शिवाय परमेश्वराचे स्वरूप लक्ष्यांत। येणार नाही. बाणाच्या वेगाने साधनांची घाई केल्याने किंवा केवळ स्वप्न बघून उपाय होणार नाही. रोग जडला तर आपण वैद्याचा शोध घेतो, अनुभव घेतल्याशिवाय औषध घेतो, त्यामुळे काहीतरी अपाय होतो.अशाप्रकारे कितितरी राजे,ऋषी व देवदेवता आले आणि लयास गेलें.जो हे सर्व पहातो तो जाणू
शकतो. रामदास देवाचे गुण गातात.
'''पद---17'''
(राग-- केदार, ताल-- त्रिताल)
नेणे मी मज काय करूं । मज माझा पडिला विसरूं ।।
असतां योग वियोग पातला । जाऊन सज्ज्नसंग धरूं।।
दास म्हणे मज माझी भेटी । होतां भेद समस्त हरूं ।।
'''भावार्थ ----'''
आपणांस आपलाच विसर पडला असून आपण आपलेच स्वरूप ओळखेनासे झालो आहोत. सतत भेटीचा योग घडत असतांना वियोगाचे दु:ख होत आहे. अशावेळी सज्जनांची संगत धरल्यास सर्व भेद मिटून जाऊन जिवा शिवाची भेटी घडते असे संत रामदास सांगतात.
'''पद---18'''
संगति साधूची मज जाली । निश्चळ पदवी आली ।।
सर्वीं मी सर्वात्मा ऐसी अंतरि दृढमती जाली ।
जागृतीसहित अवस्था तुर्या स्वरूपी समूळ निमाली ।।
बहु जन्माची जप तप संपत्ति विमळ फळेसी आली ।
मी माझे हें सरली ममता समुळी भ्रांति विराली ।।
रामी अभिन्न दास अशी हे जाणिव समुळीं गेली ।
न चळे न कळे अढळकृपा हे श्रीगुरुरायें केली ।।
'''भावार्थ ----'''
या पदांत संत रामदास साधुच्या संगतीचे महत्त्व सांगतात. साधुच्या संगतीमुळे मनाची चंचलता जाऊन ते निश्चळ बनलें.या सर्व विश्वांत आपणच आत्मरुपाने भरून राहिलो आहे अशी दृढ भावना झाली. गाढझोप,स्वप्नावस्था जागृती या तिनही अवस्था तुर्येमध्ये मिळून गेल्या.अनेक जन्मामध्यें जप,तप करुन जो पुण्यसंचय झाला तो सर्व अत्यंत विमल स्वरुपांत फलदायी झाला.मीपणाचा अहंभाव आणि माझेपणा या मुळे आलेली ममता पूर्णपणे विलयास गेली.राम आणि दास भिन्न आहेत ही भावना समूळ नाश पावली.श्रीगुरुरायाच्या अढळ कृपाप्रसादानें अज्ञान सरून अचल निष्ठा निर्माण झाली.
'''पद---19'''
साधुसंतां सांगणे हेंचि आतां ।
प्रीति लागो गोविंदगुण गातां ।।
वृत्ति शून्य जालीया संसारा ।
संतांपदीं घेतला आम्ही थारा ।।
आशा, तृष्णा राहिल्या नाहीं कांही ।
देहप्रारब्ध भोगितां भय नाहीं ।।
गाऊं ध्याऊं आठवूं कृष्ण हरी ।
दास म्हणे सप्रेम निरंतरीं ।।
'''भावार्थ---'''
गोविंदाचे गुणगायन करतांना मनामधे अत्यंत प्रेमभावना असावी ही मागणी साधुसंता कडे करून संत रामदास म्हणतात,संसाराविषयीच्या हवे नकोपणाच्या सर्व वृत्ती शून्य झाल्या नंतर आपण संतपदांचा आश्रय घेतला.आतां कोणत्याही आशाअपेक्षा राहिल्या नाहीत,प्रारब्धाने आलेले कोणतेही भोग भोगतांनां वाटणारे भय संपले आहे.आतां कृष्ण हरीचे ध्यान लावून,त्याचे गुण संकिर्तन भक्तिभावानें निरंतर करीत राहू.
'''पद ---20'''
(चाल--वरचीच )
साधुसंगे मानसी राम दाटे।
मायासिंधु तात्काळ सर्व आटे ।।
जेथें तेथें अच्युतानंत भेटे ।
ब्रह्मानंदे सर्वदा पूर लोटे ।।
राम ध्यातां होसील राम आतां ।
गंगा सिंधु होय सिंधूसि मिळतां ।।
भृंगीभैणें कीटकी होय भृंगी ।
रामदास रंगे रामरंगीं ।।
'''भावार्थ---'''
साधुंच्या संगतीत रामाचे सतत स्मरण राहते आणि मायेचा सागर तात्काळ आटून जातो.जेथे जावें तेथें अच्युतानंदाचे दर्शन घडते व ब्रह्मानंद उसळून येतो. गंगानदी सिंधुला मिळतांच ती सिंधू होते किंवा
कोशातिल किटकाची अळी फुलपाखरू होते तसेच श्रीरामाचे सतत ध्यान लावल्यास साधक राम बनतो असे संत रामदास स्वानुभवानें सांगतात.
'''पद---21'''
(चाल-वरचीच )
नाहीं नाहीं नाहीं भय नाहीं रे ।
निर्भय सज्जनसंग पाहीं रे ।।
आहे आहे आहे गति आहे रे ।
सारासार विचारूनि पाहें रे ।।
जातें जातें जातें वय जातें रे ।
नेणतां अनहित बहु होतें रे ।।
धरा धरा धरा मनीं धरा रे ।
दास म्हणे ज्ञानें हित करा रे ।।
'''भावार्थ---'''
संत रामदास या अभंगात म्हणतात, सज्जनांच्या संगतीत माणुस निर्भय बनतो यासाठी सज्जनसंगती अत्यंत आवश्यक आहे. सारासार विचारांती आपणास समजून येते की, जीवन गतीमान आहे. आयुष्य सरत जाते वय निघून जाते आणि नेणतेपणा मुळें अनहित होते. यासाठी ज्ञानाची कास धरणे जरुर आहे, ज्ञानाने जीवनाचा मार्ग सुलभ होतो.
'''पद=22'''
(राग --काफी, ताल --दादरा )
साजिरें हो रामरूप साजिरें हो ।।
रूप प्रगटलें लावण्य लाजलें मानसीं बैसलें ।।
सर्वांगसुंदर ठाण मनोहर दासाचा आधार ।।
'''भावार्थ ='''
या पदांत संत रामदास रामरूपाचे वर्णन करीत आहेत. श्री रामरूप प्रगट झालें आणि त्या रूपाचे लावण्य पाहून प्रत्यक्ष लावण्यच लज्जीत झाले. लाजलेलें हे लावण्य मनामध्ये लपून बसले.हे सर्वांगसुंदर मनोहर रूपच संत रामदासांच्या जीवनाचा आधार आहे.
'''पद=23'''
वदन सुहास्य रसाळ हा राघव ।
सर्वांगीं तनु सुनीळ हा राघव ।।
मृगनाभी रेखिला टिळा हा राघव ।
मस्तकीं सुमनमाळा हा राघव ।।
साजिरी वैजयंती हा राघव ।
पायीं तोडर गर्जती हा राघव ।।
सुंदर लावण्यखाणी हा राघव ।
उभा कोदंडपाणी हा राघव ।।
सकल जीवांचें जीवन हा राघव ।
रामदासासी प्रसन्न हा राघव ।।
'''भावार्थ ----'''
संत रामदासांवर प्रसन्न असलेल्या राघवाच्या रुपाचे वर्णन या पदांत केलें आहे. वदनावर सुहास्य धारण केलेला हा रसाळ राघव सुंदर नीलवर्णाचा आकाशासारखा निळसर आहे.राघवानें कपाळावर कस्तुरी टिळा लावला आहे आणि मस्तकावर फुलांच्या माळा घातल्या आहेत. गळ्यांत वैजयंती माळ शोभून दिसत आहे तर पायांत भक्त रक्षणासाठी घातलेलें तोडर गर्जत आहेत. हातामध्यें कोदंड धारण केला आहे. असा हा प्रसन्न राघव सकळ सजीव सृष्टीच्या जीवनाचें जीवन आहे.
'''पद--24'''
(राग = रामकली, ताल=धुमाळी )
पैल कोण वो साजणी । उभा कोदंडपाणी ।
पहातां न पुरे धणी । या डोळ्यांची ।।
रम्य निमासुर । श्रीमुख साजिरें ।
कुंडलें मकराकार । तळपतातीं ।।
घननीळ सांवळा । कांसे सोनसळा ।
मृगनाभीटिळा । रेखियेला ।।
अहिल्या गौतमवधू । मुक्त श्रापसंमंधु ।
तयाचा लागला वेधू । रामदासीं ।।
'''भावार्थ ----'''
हातामध्यें कोदंड धारण करुन पैलतीरावर कोण उभा आहे असा कीं, ज्याच्याकडे कितिही वेळ बघूनही डोळ्यांचे समाधान होत नाही. कानामध्ये मकराकार कुंडलें तळपत आहेत. त्यामुळे श्रीमुखाला
आगळीच शोभा आली आहे,जो अत्यंत कोमल असून सुंदर आहे. कमरेला पितांबर कसला असून,कपाळावर कस्तुरी टिळा लावला आहे आणि तो मेघासारखा सावळ्या रंगाचा आहे.गौतम ऋषींच्या शापामुळे शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला शापमुक्त करणाऱ्या त्या राघवाचा मनाला वेध लागला आहे असे संत रामदास म्हणतात.
'''पद =25'''
(राग --मारु, ताल --त्रिताल )
जाऊं नको रे रामा । जाऊं नको रे ।।
तुजविण देश वाटे विदेश । कां करिसी उदास ।।
राज्य त्यजावें त्वां नव जावें । भाकेसि रक्षावें ।।
रामदास स्वामी उदास । सेवीला वनवास ।।
'''भावार्थ ---'''
श्रीराम वनवासाला जाण्यासाठी निघाले असतांना नगरजनांची व राजजनांची अवस्था अत्यंत केविलवाणी होते, उदासिनतेची छटा अयोध्या नगरीला झाकून टाकतें. राघवानें आपलें प्रतिज्ञापालन करण्यासाठी फारतर राज्यत्याग करावा पण वनवास गमन करु नये अशी सर्वांचीच ईच्छा आहे. संत रामदास अत्यंत उदास मनानें या प्रसंगाचे वर्णन करीत आहेत.
'''पद ==26'''
(राग-- देस, ताल ---धुमाळी )
कै भेटेल मागुतां । राघव आतां ।।
स्वस्थ न वाटे चित्ता । बोले कौसल्या माता ।।
राम वनासी जातां । रुदती सर्व कांता ।।
रामदासी अवस्था । लागली समस्तां ।।
'''भावार्थ -----'''
राम वनवासाला गेल्यावर अत्यंत अस्वस्थ झालेली कौसल्या माता म्हणते,राघव आतां परत केव्हां भेटेल अशा प्रकारे राजभवनातील सर्वच स्त्रिया उदास मनाने रुदन (शोक) करीत होत्या. ही उदासिनता सर्वांच्या मनाला व्यापून राहिली होती.
'''पद= 27'''
(राग =खमाज, ताल=धुमाळी )
कृपाळू रघुवीरें खादिलीं भिलटीबोरें ।
उच्छिष्ट आदरें अंगिकारी रे ।।
वैभवीं नाहीं चाड ।देवातें भावचि गोड ।
पुरवितो कोड । अनन्याचें रे ।।
दुर्लभ ब्रह्मादिकांसी । सुलभ वानरांसी ।
काय तयापासीं । भावेविण रे ।।
रामीरामदास म्हणे । देव हा दयाळूपणें ।
उठवितो रणें । वानरांचीं रे ।।
'''भावार्थ -----'''
शबरीने दिलेली उष्टी बोरे रघुवीराने आदराने स्विकारून आनंदाने खाल्ली. देवाला भावभक्तीची आवड असून कोणत्याही वैभवाची ईच्छा नाही, अनन्यपणे शरण आलेल्या भक्तांच्या सर्व ईच्छा राघव पूर्ण करतो.एका अनन्य भावाशिवाय वानरसेने जवळ काहिही नव्हते, तरी ब्रह्मादिदेवांना दुर्लभ असलेला श्रीराम केवळ भक्तीभावामुळे सुलभ होतो. संत रामदास म्हणतात,राघव दयाळूपणे वानरसेनेचे नेतेपण स्विकारून त्यांना रणामध्यें विजयी करतो.
'''पद==28'''
(राग--कल्याण, ताल -- त्रिताल )
दयाळा रामा सोडवी आम्हां । हरहृदयविश्रामा ।।
बंधन पावलों बहू जाजावलों । देव म्हणती कावलों ।।
यातना हे नाना । कांहींच चालेना दु:ख जाहलें मना।।
शीणावरि शीण। होतसे कठिण । थोर मांडलें निर्वाण ।।
कर्कश उत्तरीं । नित्य मारामारी । धावें होउनि कैवारी ।।
दास चौताळला । त्रिकुट जाळिला थोर आधार वाटला ।।
'''भावार्थ ----'''
शिवशंकराच्या हृदयाला विश्राम देणाय्रा दयाळु रामचंद्राने आपणास सोडवावे अशी विनंती करून सर्व देव म्हणतात की, रावणाच्या बंधनांत पडून अत्यंत दु:खद यातना भोगत आहोत.या बंधनातून सुटण्याचा काहिही मार्ग सापडत नसल्याने हतबल झालो आहोत, प्राणसंकटांत सापडलो आहोत, परिस्थिती आधिकाधिक कठिण बनली आहे. सतत युध्दाच्या प्रसंगांना, कर्कश शब्दांना तोंड द्यावे लागत आहे अशावेळी कैवारी होऊन धाव घ्यावी ही विनंती ते श्रीरामाला करतात तेव्हां रामदास मारूती इरेस पेटला,त्याने लंका जाळून देवांना मोठा आधार दिला.
'''पद----29'''
(राग--मांड,जोगी, ताल =दीपचंदी )
सांग मला हनुमंता । राघव माझा सुखी आहे कीं, ।।
कनकमृगामुळें मोहित जालें । हा बसला मज गोता ।।
दीर सुलक्षण लक्ष्मुण गांजिला । अनुभवितें आतां ।।
दास म्हणे परिपूर्ण रघुवीर । परि वाहे मनीं चिंता ।।
'''भावार्थ -----'''
श्रीरामांच्या आज्ञेवरुन हनुमंत सिता शोधासाठी निघून लंकेपर्यंत येऊन अशोक वनातील सितेची भेट घेतो.राम विरहानें व्याकुळ झालेली सिता रामदास मारुतिला रामाचे कुशल विचारते. कनकमृगाच्या मोहांत पडल्यामुळे आपली कशी फसवणूक झाली, अत्यंत प्रेमळ,विचारी,आज्ञाधारक अशा सुलक्षणी लक्ष्मण भाउजींना कटुशब्दांनी दुखविलें याचा पश्चाताप व्यक्त करतें.रामभक्त हनुमान श्रीरामांचे कुशल सांगून ते चिंतेने व्याकूळ झाले आहेत असे वर्तमान सांगतात.
'''पद---30'''
(राग--काफी, ताल-दादरा )
उदार रामचंद्र हा वदावा किती ।।
येतां अनन्यशरण बिभिषणा शीघ्र करी ।
चिरंजीव लंकापती ।।
उत्तानचरण बाळ होत शरण तया देत ।
अढळ अक्षयी संपत्ती ।।
चिन्मयानंद भाग्य रामदासासि सहज ।
वोळला जानकीपति ।।
'''भावार्थ---'''
या पदांत संत रामदास श्रीरामाच्या औदार्याचे उदाहरण देवून वर्णन करीत आहेत.रावणबंधु बिभीषण रावणाचा अन्यायीपणाचा पक्ष सोडून श्रीरामांना शरण जातो तेव्हां श्रीराम तात्काल बिभिषणाला लंकेचा राजा बनवतो, एव्हढंच नव्हेतर त्याला चिरंजीवपद देतो.उत्तानपाद राजाचा बाळ ध्रुव घोर तप करून रामांना शरण जातो तेव्हां त्याच्यावर प्रसन्न होऊन कधीही क्षय न होणारी अक्षय संपत्ती व अढळ पद देतो. रामदासांवर प्रसन्न होऊन चिरकाल टिकणारा आनंद व सद्भाग्याचा ठेवा बहाल करतो.अशा उदार रामचंद्रांच्या औदार्याचे कसे वर्णन करावे असे संत रामदास म्हणतात.
'''पद==31।'''
(राग =मारू , ताल ==त्रिताल )
नये नये नये राघव आजि कां न ये ।।
जीव जीवाचा जप शिवाचा ।कृपाळु दीनाचा राघव ।।
प्राण सुरांचा। मुनिजनांचा । भरवसा तयाचा राघव ।।
विसर झाला। काय तयाला । दासांनी गोविला राघव ।।
'''भावार्थ ==='''
शिवशंकर ज्याच्या नामाचा सतत जप करतात, जो अत्यंत कृपाळू असून दीनांचा कैवारी आहे,देवादिकांचा केवळ प्राणच आहे आणि मुनिजनांच्या विश्वासाचे स्थान आहे असा राघव आज अजून का येत नाही असे संत रामदास विचारतात आणि उत्तरादाखल सांगतात कीं श्री रामाला विसर पडला असावा किंवा इतर भक्तांनी गुंतविला. असावा.
'''पद==32'''
( राग ==धनाश्री, ताल==धुमाळी )
नयेल काय आजि रामु । माझिया जीवाचा विश्रामु ।।
दिवस पुरलें धैर्य सरलें । वियोगे प्राण शमूं ।।
पुढती उभा राहे अष्ट दिशा पाहे । विकल होय परमू ।।
रामीरामदास वेधलें मानस । केव्हां भेटेल सर्वोत्तमू ।।
'''भावार्थ ----'''
या पदांत संत रामदासांच्या मनाची श्री राम विरहानें व्याकूळ झालेली अवस्था व्यक्त झाली आहे. श्रीराम हा आपल्या जीवाचा विश्राम असून त्याची वाट पाहून अनेक दिवस सरले आहेत,धैर्य संपून गेले असून वियोगाने प्राण जावू पहात आहे. आठही दिशांनी शोध घेऊनही रामाचे दर्शन होत नाही त्यामुळें मन विकल झाले आहे,रामाला भेटण्यासाठी आतुरले आहे.
'''पद---33'''
(राग --आसावरी, ताल --दीपचंदी )
धन्य रघुत्तम धन्य रघुत्तम धन्य रघुत्तमलीळा ।
त्रिभुवनकंटक राक्षस मारुनी फोडियल्या बंदीशाळा ।।
प्रजापालक हा रघुनायक ऐसा कदापि नाहीं।
उद्वेग नाही चिंता नाहीं काळ दुष्काळही नाहीं ।।
व्याधि असेना रोग असेना दैन्य वसेना लोकां ।
वार्धक्य नाहीं मरण नाहीं कांहींच नाही शंका ।।
सुंदर लोक सभाग्य बळाचे बहु योग्य बहुत गुणांचे ।
विद्यवैभव धर्मस्थापना कीर्तिवंत भूषणाचे ।।
'''भावार्थ -----'''
या पदांत संत रामदास श्रीरामांच्या चरित्रलीळा वर्णन करीत आहेत.त्रिभुवनांचे शत्रु असलेलेल्या राक्षसांचे निर्दालन करून प्रभु रामचंद्रांनी रावणाच्या बंदीशाळेतील देवदेवतांना मुक्त केले.श्रीरामांसारखा प्रजाहितदक्ष राजा शोधुनही सापडणार नाही.रामराज्यातील प्रजेला कोणतेही दु:ख नाही, कसलिही चिंता नाही ,कधिही दुष्काळ पडत नाहीत. लोकांना कोणत्याही प्रकारचे मानसिक अगर शारिरीक रोग नाहीत.प्रजा अत्यंत सुखी व समाधानी असून म्हातारपणीचे दु:ख अथवा अकाली मृत्युचे भय नाही.रामराज्यातील प्रजाजन भाग्यवंत, गुणवंत,रूपवंत असून विद्या हेच त्यांचे वैभव,किर्ति हेच भूषण व धर्म हेच जीवनाचे सार आहे.
'''पद---34'''
(राग== धनाश्री , ताल ==दीपचंदी )
राघव पुण्य परायण रे
पुण्यपरायण धार्मिक राजा । आनंद केला बहुत ।।
धर्मपरायण धार्मिक राजा । सकळही नीति न्याय ।।
रामराज्य सुखरूप। भूमंडळ ।दु:खशोक दुरी जाय ।।
दास म्हणे हा पूर्णप्रतापी । महिमा। सांगो काय ।।
भावार्थ -----
राघव हा पुण्यपरायण ,धार्मिक राजा असून नितिमंन्त आहे. सर्वांना सारखा न्याय देणारा आहे.रामराज्यांत सर्वत्र सुखशांती नांदत असून दु:ख व शोकाचा लवलेशही नाही. संत रामदास म्हणतात, राघव पूर्णप्रतापी आहे त्याचा महिमा वर्णन करावयास शब्दच अपूरे आहेत.
'''पद---35'''
(राग ==बिलावल, ताल ==धुमाळी )
वैकुंठवासी रम्य विलासी देवांचा वरदानी ।
तेहतीस कोटी सुरवर। भक्तांचा अभिमानी ।।
तो राघव ध्याय सदाशिव अंतरिं नाव जयाचें ।
रमणीय सुंदर रूप मनोहर। अंतरध्यान तयाचें ।।
त्रिंबकभंजन मुनिजनरंजन गंजन दानवपापी ।
वाणी जर्जर घोर महावीर केले पूर्ण प्रतापी ।।
वरद हरिगण दास बिभीषण सेवक वज्रशरिरी ।
भूमि चराचर चंद्र दिवाकर तंवरी भय अपहारी ।।
भावार्थ ----
तेहतीस कोटी देवांची बंदीवासातून मुक्तता करणारा,अतिशय रम्य विलासी जीवन जगणार्या देवांना वरदान देणाय्रा ,भक्तांचा अभिमानी अशा राघवाचे शिवशंकर सतत
ध्यान करतात व श्रीरामाच्या नामाचा जप करतात . मुनीजनांना अतिशय प्रिय असणारा,पापी राक्षसांचे दमन करणारा राघव अतिशय मनोहर आहे.तो जिंकण्यास कठिण असा महावीर असून अत्यंत पराक्रमी आहे, रामाचे वरदान लाभलेला बिभीषण रामाचा अनन्य दास असून जोपर्यंत चंद्र ,सूर्य असित्वांत आहेत तो पर्यंत त्याला मृत्युचे भय नाही , तो चिरंजीव आहे.वैकुंठवासी रामाचे अशाप्रकारे संत रामदासांनी या पदांत यथायोग्य वर्णन केले आहे.
'''पद ----36'''
परम दयाळू माझा राम ।।
दशमुखभगिनी ताटिका ते । वधुनि केलें विश्राम ।।
रावण मारुती अमर स्थापी । पाववुनी स्वधाम ।।
जानकि घेउनि अयोध्येसि आले ।दास म्हणे प्रियनाम।।
'''भावार्थ ----'''
दहा तोंडे असलेल्या दशाननाची बहिण ताटिका हिचा वध करून विश्वामित्र ऋषींचा यज्ञ पूर्णत्वास नेला. रावणाचा वध करून हनुमानाला चिंरजीवपद देऊन निज धामाला पाठवलें.जानकी देवींची कारावासातून सुटका करून अयोध्येस परत आले. संत रामदास म्हणतात श्रीराम अत्यंत दयाळू असून त्यांचे नाम सर्व भक्तांना अतिशय प्रियतम आहे.
'''पद===37'''
(राग==काफी, ताल--धुमाळी )
राजिवलोचन । भवभयमोचन पतितपावन राम ।।
श्रीरघुनंदन राक्षसकंदन । दशकंठछेदन राम ।।
संसारमंडण दानवदंडण ।रामदासमंडण राम ।।
'''भावार्थ ===='''
कमलासारखे नयन असलेला ,पतितांना पावन करून त्यांची संसार भयापासून सुटका करणारा अनेक राक्षसांचे निर्दालन करून दशानन रावणाचा कंठछेद करणारा श्रीरघुनंदन दानवांचा विनाश करून या जगताला मंडित करतो. रामभक्तांच्या मेळाव्यांत तो शोभून दिसतो.
'''पद===38'''
(राग = कल्याण , ताल = त्रिताल )
अरे तूं पावन देवा राघवा रे ।।
वांकी खळाळित तोडर गाजे । परम दीनवत्सल रामा ।।
अभिनव कीर्ति पुरंदर जाणे ।
सकळभुवनसुखदायक तूं एक ।।
दास म्हणे भवपाशनिवारण ।
नाम सकळजनपावन लीळा ।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास म्हणतात, श्रीराम संसाराची अखिल बंधन तोडून भक्तांच्या संसार बंधनांचे निवारण करतो, सर्व लोकांना पावनकरतो. तो दीनदुबळ्या लोकांचे रक्षण करतो.श्रीरामाच्याहातातिल वाकी भक्तरक्षणासाठी सतत खळाळत असतेव पायातील तोडर भक्तरक्षण हे आपले ब्रीद आहे असे गर्जून सांगत असतो.अशा पतितपावन रघुवीराची अभिनव किर्ति स्वर्गलोकीचा इंद्र जाणतो कीं,राघव सकळ जगाला सुख देणारा आहे.
'''पद==39'''
(राग==काफी , ताल==दीपचंदी )
तो राघव शरधनुधारी रे ।।
कौशिकमखदु:खार्णव खंडुनि । खरदुषाणांतें मारी ।।
सुमनशरधनु भंगुनियां । वरिली जनककुमारी ।।
श्रावणारिसुतें सागर बांधुनि । वैश्रवणानुज मारी ।।
दास म्हणे पदवारीं जडलों । भवनदीपार उतारी ।।
'''भावार्थ ==='''
खर आणि दुषण यांचा वध करून विश्वामित्र ऋषींचा यज्ञसंकल्प पूर्ण करून त्यांचे दु:ख हरण करणारा श्रीराम,मदनाचा शत्रु जो शिवशंकर त्याच्या धनुष्याचा भंग करून
जनकराज्यकन्या सीता हिला स्वयंवरांत जिंकतो. दशरथपुत्र श्रीराम सागरावर सेतू बांधून रावणाचा वध करतो. संत रामदास म्हणतात,अशा पूर्णप्रतापी रामचरणांशी आपण अनन्यभावाने शरणागत असून त्याच्या कृपेनेच ही भवनदी पार करुन जाणे शक्य होईल.
'''पद==40'''
(राग --खमाज , ताल--धुमाळी )
पूर्णकामा ही सुखधामा । विवुधविमोचन रामा ।।
पावन भूवन जीवन माझें । कोण करी गुणसीमा ।।
वाल्मिक व्यास विरंची नेणें । काय वदो गुणसीमा ।।
'''भावार्थ ===='''
भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारा श्रीराम सुखाचे भांडार आहे. विविध पापांचे क्षालन करून जीवन पावन करणार्या श्रीरामांच्या गुणांना सीमा नाही असे सांगून संत रामदास म्हणतात,वाल्मिकी ,व्यास व देवेंन्द्र हे देखील श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करु शकत नाहीत.
'''पद==41'''
( राग ---श्रीराम, ताल---द्रुत एकताल )
दिनमणिमंडणा अमरभूषणा ।
सजलजलदघना रे राघवा ।।
राजीवलोचना विबुधविमोचना ।
विमळगुणा सगुणा रे राघवा ।।
दास म्हणे मनाअंतरजीवना ।
स्वजनजनासज्जना रे राघवा ।।
'''भावार्थ===='''
या पदांत संत रामदास विविध गुणविषेषण योजून राघवाचे वर्णन करीत आहेत.दिनमणी म्हणजे सूर्याप्रमाणे जगाला प्रकाशित करणारा,देवांचे भूषण असलेला,पाण्याने ओथंबलेल्या मेघा प्रमाणे सावळी रंगकांती असलेला ,उदार ,कमलाप्रमाणे डोळे असलेला, देवांची कारागृहातून मुक्तता करणारा, अनेक विमळ (दोषरहित) गुणांनी युक्त ,सगुण-स्वरुपी राघव स्वजनांचे तसेच सज्जनांचे रक्षण करणारा असून प्रत्येकाच्या अंत:करणांत वास करतो.
'''पद===42'''
(राग --मारू, ताल ---त्रिताल )
महिमा कळली न जाय । राघव ।।
कोण वानर कोण निशाचर । बांधिती सागर काय ।।
कोण सुरवर कोण गिरीवर । अघटित घटित उपाय ।।
गुणी गुणागर नागरलीळा । दास सदा गुण गाय ।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास म्हणतात , राघवाचा महिमा इतका अपरंपार आहे कीं,त्यांनी वानर आणि निशाचर यांच्या कडून सागरावर सेतू बांधून घेतला. लक्ष्मणाला सावध करण्यासाठी द्रोणाचला सारखा प्रचंड पर्वत बाहुबलानें हिमालयातून लंकेपर्यंत वाहून आणण्याचे अघटित काम हनुमानाने तडीस नेलें.गुणांचे भांडार असलेल्या राघवाच्या या लिळांचे संत रामदासांना नेहमीच कौतुक वाटते. ते राघवाच्या नागर लीळांचे गुण गातात.
'''पद===43'''
(राग ---काफी, ताल---दादरा )
रंग रामीं मना रंग रामीं ।
रागरंग तोचि अभंग व्यर्थ कामीं ।।
रामपायीं गुंतुनि राहीं । कां पडसी अपायीं ।।
राम आमुचा जीव निजाचा । ठाव विश्रामाचा ।।
कीर्ति जयाची वर्णितांची । मुक्ति रे फुकाची ।।
कोळी कबीर दास अपार । तारिले साचार रे ।।
नाम जपावें अनन्य भावें । रामदास व्हावें ।।
'''भावार्थ ==='''
श्रीराम हा भक्तांचा आत्मरुपी जीव असून चिरंतन विश्रांतिचे ठिकाण आहे, वाचेने राम किर्ति वर्णितांच जीवाची जन्ममरणाच्या फेर्यातून सहजपणे सुटका होऊन मुक्ती मिळते असा विश्वास संत रामदास व्यक्त करतात. वाल्याकोळी , संत कबीर केवळ रामनामाच्या जपाने संसारसागर तरून गेले.अनन्यभावाने, संपूर्ण शरणागत होऊन रामनाम जपावें,रामनामाच्या रंगात रंगून जावे,रामचरणाशी गुंतून रहावे आणि रामदास ही अक्षय पदवी प्राप्त करावी असा उपदेश संत रामदास या पदांत करतात.
'''पद===44'''
(राग--सारंग, ताल--धुमाळी )
देखिला राघव नयनी । मृदुसुमनशयनी ।।
नासतसे तम भासत उत्तम ।
धन्य विरोत्तम राम रघोत्तम ।।
सर्व गुणागुण निर्मळ ते गुण ।
विमळविभूषण भक्तविभूषण ।।
भक्त गुणीजन मुक्त मुनीजन ।
देव बहुजन वंदिति सज्जन ।।
'''भावार्थ ==='''
श्रीराम सर्व पराक्रमी वीरांमध्ये श्रेष्ठ असून रघुवंशामध्यें सर्वोत्तम आहे.सर्वगुणांमधील निर्मळ गुणांनी शोभत असून भक्तांचे भूषण आहे. गुणी भक्त,मुक्त मुनीजन, संतजन तसेच सर्व देवदेवता श्रीरामाला वंदन करतात असा सर्वोत्तम राम कोमल सुमनांच्या शय्येवर शयन करीत असलेला आपण पाहिला असें संत रामदास या पदांत वर्णन करतात.
'''पद===45'''
राममय मानस झालें । चिंतनी चित्त निवालें ।।
हर अपरंपर त्याचेहि अंतर । ज्याचेनी नामें निवालें ।।
निरंजनी मन पहातां शोधून ।अद्वेती द्वैत बुडालें ।।
रामदासी ध्यान हेचि साधन । मीपण रामीं बुडालें ।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास ध्यानमार्ग हेच परमेश्वराशी एकरूप होण्याचे एकमेव साधन आहे असे सांगून स्वता:चा अनुभव अधोरेखित करतात.रामाचे ध्यान लागतांच मन राममय झालें,चित्त शांत झाले. निर्मळ , निरामय मनाचा शोध घेतांना जीव, शिवाचे अलगपण (द्वैत ) विरून गेले आणि अद्वैताचा अनुभव आला.
'''पद===46'''
मानस वेधले रामी । सच्चिदानंद घनश्यामी ।हो मानस।।
रामीं रंगलें कामीं विन्मुख जालें । विश्रामलें निजधामी ।।
मन हे आपण सोडुनी मीपण । लोधलें आरामी ।।
रामीरामदास सर्वस्वें उदास ।निष्कामता सर्वकामी ।।
'''भावार्थ ----'''
संत रामदास सच्चिदानंद घनश्याम रामचरणाशी गुंतून गेलें,रामरंगांत गुंतलेले मन कामवासनेपासून परावृत्त झालें. मनाचा मीपणा समूळ नाहीसा झाला आणि श्री रामपदासी मन विश्राम पावलें.संत रामदास सर्व कामनांपासून विरत्त होऊन निष्काम , उदासीन बनलें.
'''पद===47'''
राघवी मन तल्लीन जालें । आपेंआप निवालें ।।
नीलतमाल तनु रूप साजें। देखत सुख सुखासि मिळाले।।
राघवदास विलासत। भासे । सुखी दु:ख निमालें ।।
'''भावार्थ ----'''
संत रामदास म्हणतात, राघवाची निळसर, सावळी सुंदर देहकांती पाहून मन देहभान विसरून गेले ,आपोआप शांतीसुखाचा अनुभव येऊन मन निवांत झालें. सुख सुखाला मिळून दु:ख लोपून गेले.
'''पद===48'''
तेथें माझे तन मन धन ।।
परमसुंदर रूप मनोहर । करी धरूनि धनुर्बाण ।।
राम लक्ष्मण जनकतनया । वामभागीं शोभताहे ।।
पीत पितांबर कासिला कांसें । शोभतसे दिव्यठाणे ।।
भीम भयानक सन्मुख मारुती। कर जोडुनि वाट पाहे ।।
'''भावार्थ ----'''
मन हरण करणार्या ,अत्यंत सुंदर राघवाचे हतात धनुष्य बाण धरलेलें रुप पाहून आपण देह देहभान विसरून गेलो. राम लक्ष्मण आणि डाव्या बाजुला जनक राजाची कन्यका सीता शोभून दिसत आहेत. राघवाने पिवळा पीतांबर परिधान केला असून समोर भीमकाय भयानक मारुती आज्ञापालनासाठी हात जोडून उभा आहे श्रीरामाचे असे वर्णन संत रामदासांनी या पदांत केले आहे.
'''पद===49'''
महिमंता रे हनुमंता । संगितज्ञानमहंता रे ।।
बलभीमा रे गुणसीमा । सीमाचि होय नि:सीमा रे ।।
कळिकाळा रे विक्राळा । नेत्री भयानक ज्वाळा रे ।।
हरिधामा रे गुणधामा दास म्हणे प्रिय रामा रे ।।
'''भावार्थ ==='''
संगिताचे उत्तम ज्ञान असलेला हनुमंत उत्तम बुध्दीबल, शारिरीक बल धारण करणारा असून त्याच्या गुणांना सीमा नाही हनुमंताच्या नेत्रांमध्ये भयानक ज्वाळा असून प्रत्यक्ष काळाला सुध्दा भय वाटावें असे विक्राळ रूप धारण केले आहे.हनुमान हा विविध गुणांचे भांडार असून श्रीरामाला अत्यंत प्रिय आहे.
'''पद===50'''
(राग- सारंग, ताल-धुमाळी )
सामर्थ्याचा गाभा । तो हा भीम भयानक उभा ।
पाहतां सुंदर शोभा । लांचावले मन लोभा ।।
हुकारें भुभु:कारें । काळ म्हणे रे वा रे
विघ्न तगेना। थारे । धन्य हनुमंता रे ।।
दास म्हणे वीर गाढा ।रगडित घनसर दाढा ।
अभिनव हाचि पवाडा । पाहतां न दिसे जोडा ।।
'''भावार्थ==='''
रामभक्त हनुमान हा सामर्थ्याचा गाभा असून प्रचंड देहयष्टी मुळे तो भयानक वाटतो तरीहि त्याचे सौंदर्य मनाला मोहून टाकते.हनुमानाचा भुभु:कार ऐकून प्रत्यक्ष काळ सुध्दा प्रशंसा करतो.संत रामदास हा खरा पराक्रमी वीर म्हणून हनुमानाची स्तुती करतात.हनुमंता पुढे सर्व विघ्ने पळून जातात,कुणिही हनुमानाशी तुलना करु शकत नाही.
'''पद==51'''
कैवारी हनुमान। आमुचा
पाठी असतां तो जगजेठी । वरकड काय गुमान ।।1।।
नित्य निरंतर रक्षी नानापरी । धरुनियि अभिमान ।।2।।
द्रोणागिरी करिं घेउनि आला । लक्ष्मणप्राणनिधान ।।3।।
दासानुदासा हा भरवसा । वहातसे त्याची आण ।।4 ।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास या अभंगात लक्ष्मणाचे प्राण वाचवण्या साठी द्रोणागिरी घेऊन येणार्या हनुमानाची महती सांगत आहे.नाना परीने हनुमान भक्तांचे रक्षण करतो.हनुमानाच्या सर्व भक्तांना याची खात्री वाटते, तो पाठराखा असल्याने इतरांची पर्वा करण्याची कांहीच गरज नाही असे विश्वासाने संत रामदास सांगतात.
'''पद ===52'''
मारुति सख्या बलभीमा रे । मारुति ।।धृ ।।
अंजनिचे वचनामृत सेवुनी । दाखविसी बलसीमा रे ।।1।।
वज्रतनू अतिभीम पराक्रम । संगित गायन सीमा रे ।।2।।
दास म्हणे तूं रक्षीं आम्हां । त्रिभुवनपालक सीमा रे ।।3।।
'''भावार्थ ==!'''
वज्राप्रमाणे कणखर शरीर असलेला मारुति अतिशय पराक्रमी आहे . बलभीम संगीत व गायन कलेंत निपुण आहे. अंजनीमातेच्या आज्ञेनुसार तो आपले बल दाखवतो.संत रामदास त्रिभुवनपालक मारुतीला आपले रक्षणकरण्याची विनंती करतात.
'''पद ===53'''
(राग --काफी, ताल --दीपचंदी )
आनंदरुप वनारी रे । तो आनंद सुरवरनर मुनिजन मनमोहन। सकळ जना सुखकारी रे ।।1।।
अचपळ चपळ तनु सडपातळ ।
दास म्हणे मदनारी रे ।।2।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास हनुमान मारुतीला आनंदरुप वनारी असे संबोधुन तो सूरवर व मुनिजनांच्या मनाला मोहिनी घालून त्यांना आनंद देणारा आहे, सर्व जनांना सुख देणारा आहे. अतिशय सडपातळ तनु असलेला हनुमान अती अचपळ असून संत रामदास सांगतात कीं, तो मदनाचा शत्रु जो शिवशंकर त्यांचा अवतार आहे.
'''पद ===54'''
( चाल ---उध्दवा शांतवन )
किती प्रताप वर्णू याचा । श्रीसमर्थ मारुतीचा ।।धृ 0 ।।
सूर्य तपेल बाराकळी । पृथ्वीची होईल होळी ।
अंतक जो कळिकाळाचा ।।1।।
कल्पें अनंत होतीं जातीं । नोहे वृध्द तरुण मारुती
अजरामर देह जयाचा । ।।2।।
दास म्हणे धन्य बलभीमि । सहस्त्रमुखा न वर्णवे महिमा
काय बोलूं मी एट जिभेचा। ।।3।।
'''भावार्थ ===!'''
श्रीसमर्थ मारुतीच्या प्रतापाने सूर्य बारा कलांनी तापेल आणि पृथ्वी जळुन खाक होऊन तिची होळी होईल.तो कळीकाळाचा अंत करणारा आहे .युगामागुन युगे आणि अनंत कल्पे होतील आणि जातील पण मारुती कधीच वृध्द होणार नाही कारण त्याचा देह अजरामर आहे. संत रामदास म्हणतात, हजार मुखे असलेला नागराज शेष सुध्दा ज्याचा महिमा वर्णु शकत नाही तो मारुती धन्य होय .अशा प्रतापशाली मारुतीचा महिमा आपल्या सारखा एक जीभेचा मानव कसा वर्णन करु शकेल ?
'''पद==55'''
तो हा प्रळयरुद्र हनुमान ।न वर्णवे महिमान ।।ध्रु ।।
नीलशैल्यसम भीषण भीम वारणवज्रशरीरी ।
ठाण उड्डाण मांडूनी उभा लांगुळ भूमी थरारी ।।1।।
कांचकच्छ पीतांबर कासे वाहुनी चपेटा ।
तीक्ष्ण नखें रोमावळी सित काळासी देत थपेटा ।।2।।
कंडलें लोळ कपोळ झळाळित लोचन पीटतावी ।
विक्रांतानन दशन भयंकर अदट वीर दटावी ।।3।।
ब्रह्मचारी शिखा सूत्रधारी मेखळा अतीशोभताहे।
दास उदास रामासन्मुख हस्तक जोडुनी आहे .श
'''भावार्थ ==='''
या अभंगात संत रामदास हनुमानाच्या स्वरुपाचे वर्णन करीत आहेत. वज्रासारखे शरीर असलेला,नील पर्वता प्रमाणे कांती असलेला हनुमान भिती निर्माणकरतो.उड्डाण घेण्याच्या पावित्र्यांत उभा असलेल्या हनुमानाच्या शेपटीमुळे भूमी कंप पावत आहे। पितांबराचा कासोटा त्याने कमरेभोवती घट्ट बांधला आहे.हनुमानाची तीक्ष्ण नखे, कानातील कुंडले, भव्य कपाळ, तेजस्वी डोळे,शरिरावरचे रोमांच काळाला थपडा मारीत आहेत.हनुमानाचे उग्र ,विक्राळ तोंड वीरांच्या मनांत भय निर्माण करते. मस्तकावरील शेंडी, गळ्यातील माळ अतिशय शोभून दिसत आहे .असा हा रामाचा दास रामासमोर हात जोडून उभा आहे.
'''पद ==56'''
(राग --विहाग, ताल --धुमाळी )
तांडव नृत्य करी देवाधिदेव
थैया थैया धमक जातसे । सरी न दिसे दुसरी ।।1।।
नटनाट्यकळा सकळ जाणे । चाकाटल्या किन्नरी ।।2।।
गीतनृत्यवाद्यधनस्वरादिक । दास म्हणे विवरीं। ।।3।।
'''भावार्थ ==!'''
या पदांत संत रामदास देवाधिदेवाच्या तांडवनृत्याचे वर्णन करीत आहेत .अतंत्य जलद गती असलेल्याया नृत्याची बरोबरी कुणीच करु शकत नाही .महादेव सर्वनटनाट्य कलांचे जाणकार असून गीत, नृत्य,वाद्य व स्वरयांचा सुरेख मेळ जमला आहे गंधर्व स्त्रिया सुध्दा चकित होतात.
'''पद ==57'''
( राग कल्याण, ताल ==त्रिताल )
हरिवीण काय रे उध्दवा। ।।ध्रु 0 ।।
ज्ञान न माने ध्यान न माने । आणीक व्यर्थ उपाय ।।1।।
नित्यनिरंजन ध्याती मुनिजन । मानस तेथ न जाय ।।2।।
निर्गुण ते खुण अंतर जाणे । दास गुणगाण गाय। ।।3।।
'''भावार्थ =='''
हरि भक्तिशिवाय ज्ञानमार्ग ,ध्यानमार्ग आणि बाकी सर्व उपाय व्यर्थ आहेत.मुनिजन त्या नित्य निरंजन स्वरुपाचे सतत ध्यान करतात परंतू मन त्या निराकार निर्गुण परमेश्वरा पर्यंत पोचत नाही.संत रामदास म्हणतात ,या श्री हरिपर्यंत पोचण्याची खुण अंत:करणाने जाणावी व सतत त्याच्या गुणांचे गुणगान करावे.
'''पद==58'''
समजत वेधिलें मना । धन्य धन्य मोहना ।।ध्रु0।।
दिसत भासे रम्य विलासे । अगणित गुणगणना ।।1।।
चमकत चित्त चकितचि जालें । लीन तल्लीन निवालें ।।2।।
अंतरिचा हरि अंतरल्यावरी । मग काय भूषण ।।3।।
त्याविण हा जीव जाइल माझा । दास म्हणे मरणे। ।।4।।
'''भावार्थ ==='''
या श्रीहरीने नकळत मनाचा वेध घेतला आहे ,तो मनमोहन धन्य आहे. या मोहनाचा मनोहर विलास सर्व सृष्टींत भासमान होतांना दिसून येतो.त्याच्या गुणांची गणना करणे केवळ अशक्य आहे.मोहनाचा हा गुणविलास पाहून चित्त आश्चर्यचकितहोते,त्याच्यास्वरुपांततल्लीनहोते.अंत:करणांत वसणारा हा हरी अंतरला तर त्याच्याशिवाय प्राण निघून जाईल,मरण ओढावेल.
'''पद==59'''
वेणु वाजे , सुरस वेणु वाजे। ।। ध्रु 0।।
रुणझुण रुणझुण मंजुळ मंजुळ । अहो रंग माजे ।। 1।।
ऐकोनी तो कीळ थक्कित कोकिळ । अहो कंठ लाजे ।।2।।
धीर समीरे यमुनातीरे । अहो तुंब माजे ।।3।।
दासपालक चित्तचालक । अहो गोपीराजे। ।।4।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत ज्ञानेश्वर गोपीराज श्री कृष्णाच्या सुरस वेणु (बासरी )वादना विषयी सांगत आहेत.बासरीचा रुणझुण असा मंजुळ,कानाला गोड वाटणारा आवाज वातावरणांत प्रसन्न रंग भरतो. तो आवाज ऐकुन कोकिळ लज्जित होते, हे बासरीचे स्वर ऐकण्यासाठी यमुना तीरावर गोप गोपिकांची दाट गर्दी जमली आहे.
'''पद ==60'''
सुरस मधुर वेणु । वाजवितो रुणझुणु । ।।ध्रु0।।
विकळ होती हे प्राणु। भैटीकारणे। ।।1।।
रुप मनी आठवे । आवडी घेतली जीवे ।
यदुवीरा पहावें । सर्व सांडोनी। ।।2।।
अखंड लागलें ध्यान । स्वरुपीं गुंतलें मन ।
सकळ पाहतां जन । आठवे हरी। ।।3।।
सकळ सांडोनी आस । तयालागी उदास ।
फिरे रामदास ।वेधु लागला हरीचा ।।4।।
'''भावार्थ ==!'''
संत रामदास म्हणतात, यदुवीर जेव्हां वेणु वाजवतो तेव्हां ते सुरस ,मधुर स्वर त्याच्या भेटीसाठी प्राण व्याकुळ करतात . यदुवीराचे रुप आठवून मनांत त्याची आवड निर्माण होते. सर्व सोडून त्याला पहावे असे वाटते.यदुवीराच्या स्वरुपांत मन गुंतून त्याचे अखंड ध्यान लागते,सर्व लोकांमध्ये तोच सामावला आहे असे वाटते.सगळ्या आशा,ईच्छा सोडून उदासीनबनलेलेरामदास हरिचा शोध घेत फिरतात.
'''पद ===61'''
राधे तुझा कृष्ण हरी । गोकुळांत फंद करी ।
जाऊनि गौळर्णीला धरी । दहीदूध चोरी करी। ।। ध्रु।।
मथुरेची गौळण थाट । शिरीं गोरसाचा माठ ।
आडवितो आमुची वाप । करितो मस्करी । ।।1।।
संगे घेउनी गोपाळ। हिंडतसे रानोमाळ ।
करितो आमुचे बहु हाल । सोसावे कुठवरी ।।2।।
गुण याचे सांगू किती । सांगता मज वाटे भ्रांती ।
वाईट आहे याची रीति । ऐसा हा ब्रह्मचारी। ।।3।।
गौळण होउनिया लीन । जाती हरीला शरण।
क्षमा करिजे मनमोहन । दास चरण धरी। ।।4 ।।
'''भावार्थ ==='''
या पदांत गौळणी राधेकडे कृष्णाची कागाळी करीत आहेत. कृष्ण गौळणीच्या घरी जाऊन दह्या दुधाची चोरी करतो, डोक्यावर दुधाची घागर घेऊन मथुरेच्या बाजाराला जात असतांनाकान्हा वाट अडवून मस्करी करतो. गोपाळांना बरोबर घेऊनरानोमाळ भटकतो,खोड्या कढून सतावतो. ब्रह्मचारी असून कृष्णाची वागण्याची रीति अगदी वाईट आहे.अशाप्रकारे तक्रार करणार्या गौळणी शरणागती पत्करुन हरीला शरण जातात. संत रामदास यामनमोहनाची क्षमा मागून चरणाशी नतमस्तक होतात.
'''पद ==!62'''
(राग --केदार, ताल ---त्रिताल )
हरिवीण घडी गमेना । हरिविण शोक शमेना। ।।ध्रु0।।
रुप मनोहर ज्याचे । लागलें ध्यान तयाचें। ।।1।।
युगासम दिवस जातो । रामदास वाट पहातों। ।।2।।
या पदांत संत रामदास मनाला लागलेल्या हरिदर्शनाच्या ओढी विषयी बोलत आहेत. हरिच्या दर्शना शिवाय एक एक घडी युगासारखी वाटते. मनातिल शोक संपत नाही.त्याचे मनोहर रुप नजरेपासून हलत नाही,सतत याकृष्णाचे ध्यान लागते.
'''प--6द-3'''
(राग---शंकराभाष्य, ताल--द्रुतूएकताल )
दंडडमरुमंडित । पिनाकपाणी ।।ध्रु0 ।।
कंठी आहे हळाहळ । माथां वाहे गंगाजळ ।।1।।
शिरीं रुळे जटाभार । गळां फुंकती विखार ।।2।।
पांच मुखें पंधरा डोळे । गळां साजुक सीसाळें ।।3।।
हिमाचलाचा जामात । हातीं शोभे सरळ गात। ।।4 ।।
रामीरामदास स्वामी । चिंतीतसे अंतर्यामी ।।5 ।।
'''भावार्थ =='''
या पदांत संत रामदास शिवशंकराच्या स्वरुपाचे वर्णन करीत आहेत . हातामध्ये दंड, डमरु धारण केलेला असून समुद्र मंथनातून निघालेले हळाहळ (विष ) कंठामध्ये धारण केले आहे तर मस्तकावरील जटांमधून गंगाजल वाहत आहे. गळ्यामधे सर्पमाळ घातलेली असून ती कंठमाळे सारखी शोभून दिसत आहे .असा हा पिनाकपाणी हिमालयाचा जामात असून संत रामदास या शिवशंकराचे अंतर्यामी सतत ध्यान करतात.
पद == 64
देवहरे हरे महादेव हरे हो। ।।ध्रु0।।
कंठी गरळ गंगजळ माथां ।
भालनयन शूलपाणी हरे हो ।।1।।
दंडी व्याळ विभूतीलेपन ।
पंचानन शिवशंभु हरे हो। ।।2।।
उमाकांत निवांत निरामय ।
दासहृदय जय देव हो हो। ।।3।।
'''भावार्थ ==='''
शिवशंकराच्या गळ्यामध्ये समुद्र मंथनातून निघालेले विष असून माथ्यावरील जटांमधून गंगेचे उदक वाहत आहे. कपाळावर तिसरा डोळा असून हातामध्ये त्रिशुळ धारण केले आहे,दंडावर सर्प माळा असून सर्वांगावर भस्म माखले आहे. पाच मुखे असलेला शीवशंभु निवांत आणि निरामय आहे. संत रामदासांचे हृदय या महादेवाने व्यापले आहे.ते शिवशंभुच्या नावाचा जयजयकार करतात.
'''पद ==65'''
सांब दयेचे देणे , मज हें
धन सुत दारा बहुदुस्तरा,
सत्यासत्य मी नेणें ।।मज0।।
स्वात्मसुखाची प्रभा उजळली
सर्व सुखाचें लेणें ।।
दास म्हणे मज आसचि नाहीं
शिवनामामृत घेणें ।। मज0।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास म्हणतात पैसा , संतती आणि पत्नी यांच्या मोहातून बाहेर पडणे महा कठीण आहे. सत्य आणि असत्य मी जाणत नाही .सांब सदाशिवाचे कृपादान म्हणजे स्वसुखाची प्रभाच उजळली आहे किंवा हा सर्व सुखाचा मौल्यवान दागिनाच भेट मिळाला आहे. शिवनामामृत घेणे हाच आपला ध्यास असून त्या शिवाय कोणतिही ईच्छा नाही.
'''अभंग =66'''
रामनाम जपतो महादेव ।
त्याचा अवतारी हा खंडेराव
हळदीची भंडारी उधळिती ।
तेणे सोन्यारुप्याची भांडारें भरती
मणिमल्लमर्दन देव ।
एका भावे भजतां मार्तंडभैरव
म्हाळसा बाणाई सुंदरी ।
मध्ये शोभे भूषणमंडित मल्लारी
अखंड रणनवरा।
यश पावा त्याचें भजन करा
एकचि स्वर उठतो ।
समरंगणि लक्षानुलक्ष मोडितो
रोकडे नवस पूरती ।
कोणीतरी आधीं पहावी प्रचीती
अखंड प्रचिती जनी।
दास म्हणे ओळखा मनींचे मनीं
अ
'''भावार्थ =='''
हा खंडेराव अखंड रामनाम जपणाय्रा महादेवाचा अवतार आहे. तो हळदीची भांडारें उधळतो त्यामुळे सोन्यारुपाचीं भांडारें भरतात.असे संत रामदास म्हणतात. मणिमल्ल दैत्याचा मर्दन करणारा हा देव असून भक्तिभावाने त्याचे भजन केल्यास सर्व कार्यांत यश प्राप्त होते. म्हाळसा व बाणाई यांच्या मधोमध अलंकार परिधान केलेला हा मल्लारी शोभून दिसतो. अखंडपणे रणांत झुंजणारा हा वीर असून समरांगणांत लक्षावधी शत्रु सैन्याला कंठस्नान घालतो. भक्तांच्या नवसाला पावणारा हा देव असून भक्तांनी याची प्रचिती जरूर पहावी आणि आपले मनोगत पूर्ण करावे असे संत रामदास या पदांत सांगतात.
'''पद ==६८'''
जय जय भैरवा रे।।ज.।।
तुझे भजन लागे सदैवा रे। ॥ध्रु ।।
काळभैरव बाळाभैरव ।।बा ।।
टोळभैरव बटुभैरव ॥1॥
नाना प्रकारिचे विखार ।।प्र ।। ॥२॥
तयाचा करितसे भैरी संहार
काळ काळाचाही काळ ।
महाकाळाचाही काळ । दास म्हणे तो हा क्षेत्रपाळ।।3॥
'''भावार्थ =='''
काळभैरव ,बाळाभैरव, टोळाभैरव, बटुभैरव या विविध नावे प्रसिध्द असलेल्या भैरवाचा जयजयकार करून संत रामदास त्याचे भजन सदैव लागो असे म्हणतात. भैरवनाथ महाकाळाचाही काळ असून तो क्षेत्रपाळ फआहे.नाना प्रकारचे विखारांचा तो संहार करतो.
'''पद==६९'''
(राग-मालकंस, ताल - त्रिताल )
रामवरदायिनी जननी । रूप कळे कळे मननी
गगनमंडळीं गुप्त खेचर । योगीमुनिजनध्यानी
रम्य योगिनी नाटक । सकळभूती भुवनीं
अंतरवासी दास विलासी । ऊर्ध्व भरे गगनी
'''भावार्थ =='''
रामाला वर देणार्या अंबा मातेचे रुप केवळ मनालाच समजून येते.आकाश मंडळांत स्वैर संचार करणारे गुप्त खेचर यांना व योगीमुनिजनांना ध्यानावस्थेंत हे रूप बघतां येते. या योगिनीची नाटकलिला भुवनातिल सर्व प्राणिमात्रांच्या वर दिसून येते असे संत रामदास म्हणतात.
'''पद ==७०'''
सोडविल्या देवफौजा ।आला वैकुंठींचा राजा ।
संहारिले रजनीचर । देवभक्तांचिया काजा ।।ध्रु।।
दास मी समर्थाचा । मजला कोणी जाणेना ।
मुळींची कुळदेव्या हे । तिणे रक्षिलें मना ।।१॥
अजिंक्य ते संहारिले । भूमीभार फेडिला ।
ऐसीया समर्थाला । जिणें वरु दिधला ॥२॥
ते सोय धरूनियां । गेलों तुळजेच्या ठायां ।
तिनें मज आश्वसिलें । भेटविलें रामराया ॥३॥
'''भावार्थ'''
देव ,भक्तांच्या रक्षणासाठी वैकुंठीचा राजा धावून आला.काराग्रुहांत अडकून पडलेल्या देवांना सोडविलें.अजिंक्य निशाचरांचा संहार केला. या राक्षसांच्या पापाच्या भाराने त्रासलेल्या भूमीचा भार हलका झाला.
अशा समर्थ श्री रामांना कुळदेवीने वर दिला.हा प्रसंग ध्यानीं आणून तुळजा भवानिला शरण गेलो असतां तिने आश्वासन देवून रामरायाची दर्शन भेट घडवून आणली असे संत रामदास या पदांत म्हणतात.
'''पद ==७१'''
वोळली जगन्माता । काय उणें रे आतां ।
वैभवा जातजातां । भक्त हाणती लाता ॥ध्रु ॥
वोळलें भूमंडळ । परिपूर्ण पाहतां ।
राम आणि वरदायिनी । दोन्ही एकचि पाहतां ॥१॥
मनामाजीं कळों आलें । तेणें तुटली चिंता ।
रामरूप त्रिभुवनीं । चाले सर्वही सत्ता ॥२॥
रामदास म्हणे माझें । जिणें सार्थक जालें।
देवो देवी ओळखितां । रूप प्रत्यया आलें
'''भावार्थ =='''
प्रत्यक्ष जगन्माता प्रसन्न झाल्यावर भक्ताला कशाचीच कमतरता नसते. सर्वकांही परिपूर्ण असल्याने भूमंडळा वरील सर्वच प्रसन्न होतात. श्री राम व वरदायिनी माता भिन्न नसून एकच आहेत हे समजून आल्यावर सर्व चिंता संपली. तिनही भुवनीं एकच रामरूप अस्तित्वात असून त्याचीच सत्ता सर्वत्र चालते असे सांगून संत रामदास म्हणतात, देव व देवी यांचे निजरूप ओळखतां आल्याने सगळीकडे तेच रूप भरून राहिले आहे याचा प्रत्यय आला .
'''पद ==७२'''
माय वोळली माय वोळली ।
माय वोळली दया कल्लोळली ॥ध्रु।।
चळवळी जनी चळवळी मनीं ।
आनंदभूवनी वरद झाली ॥१॥
भडस पुरविते भाग्य भरविते ।
कीर्ति उरविते बोललेपणें ॥2॥
मूळ मूळिंचें डाळ मूळिंचें
फळ मूळिंचें प्राप्त जाहलें ॥३॥
रामवरदा दासवरदा ।
रक्षिते सदा सत्य प्रत्यय ॥४॥
'''भावार्थ ==='''
जगदंबा माता प्रसन्न झाली ,तिच्या दयेचा पूर लोटला. सर्व लोकांच्या मनांत उत्साहाचे वारे वाहू लागले. आनंदवनभुवनी(महाराष्टांत)वरदायिनी ठरली .मनोकामना पुरवणारी, भाग्य उजळवणारी, कीर्तिपसरवणारी अशी तुळजाभवानी. शिवरायांच्या वंशाचे मूळ, त्या मूळाला फुटलैली फांदी व फांदीला लागलेलें स्वराज्याचे फळ ,ही भवानी रामाची वरदायिनी, रामदासांना वर देणारी असून सदा रक्षणासाठी तत्पर असते.
'''पद ===७३'''
अरे तूं दीनदयाळा पाव वेगीं ॥ध्रु 0॥
अहंममता मम घातकी । जाते घालूनी घाला ॥१॥
निर्जरमौळीविभूषणा । धीर बुडाला चाल वेगीं ॥२॥
दास म्हणे करुणालया । जीव व्याकुळ जाला ॥३॥
'''भावार्थ ==='''
या अभंगात संत रामदास दीनांवर दया करणाऱ्या श्री रामाची व्याकुळतेने आळवणी करीत आहेत. अहं ममता ही अत्यंत घातकी आसून ती अचानक घाव घालून जाते. अशा वेळी माणसाचा धीर खचून जातो,जीव व्याकुळ होतो.आता विलंब न करता यातून सुटका करावी.
'''पद==७४'''
अपराध माझा क्षमा करी रे श्रीरामा
दुर्लभ देह दिधलें असतांनाहीं तुझिया प्रेमा ।
व्यर्थ आयुष्य वेंचुनि विषयीं जन्मुनि मेलों रिकामा ॥१॥
नयना सारिखें दिव्य निधान पावुनिया श्रीरामा ।
विश्वप्रकाशक तुझें रूपडें न पाहें मेघ:शामा ॥२॥
श्रवणे सावध असतां तव गुणकीर्तनिं त्रास आरामा ।
षड्रसभोजनी जिव्हे लंपट नेघे तुझिया नामा ॥३॥
घ्राण सुगंध हरुषें नेघे निर्माल्य विश्रामा ।
करभूषणें तोषुनि नार्चिति तव स्वरूपा गुणग्रामा ॥४॥
मस्तक श्रेष्ठ हें असतां तनुतें न वंदीं पदपद्मा ।
दास म्हणे तूं करुणार्णव हे सीतालंकृटतवामा ॥५॥
'''भावार्थ =='''
मनुष्य म्हणून जन्माला येणे हा योग अनेक जन्मांनंतर येतो .हा दुर्लभ देह मिळूनही श्री रामाविषयी मनात प्रेम नाही. मनुष्य जन्माला येऊन इंद्रियजन्य विषयात व्यर्थ आयुष्य वाया घालवले. नयनांसारखी दिव्य ज्योतीची देणगी मिळूनही विश्वाला प्रकाशित करणारे मेघश्यामाचे रूप पाहू शकत नाही. कर्णेद्रिये सावध असतांना श्री रामाच्या गुणांची किर्ति ऐकतांना त्रास वाटतो. सहा प्रकारचे स्वाद असणार्या भोजनाला चटावलेली जीभ भगवतांच्या नामस्मरणात रममाण होत नाही. सुगंधामुळे आनंदित होणारी घ्राणेंद्रिय श्री रामांच्या पदकमलावरील निर्माल्याच्या सुवासाचा लाभ घेत नाही. सर्वश्रेष्ठ इंद्रिय मस्तक हे असूनही ते श्री राम चरणकमलांना वंदन करीत नाही. संत रामदास म्हणतात,डाव्या बाजूस सिता शोभून दिसत आहे अशा करुणासागर श्री रामांनी या सर्व अपराधाबद्दल आपल्याला क्षमा करावी.
'''पद ==७५'''
वेधु लागो रे छंदच लागो रे। भजन तुझे मन मागे रे ।।ध्रु।।
वय थोडे रे बहु झाडे रे। संसार सांकडें बहु कोडे रे।। 1।।
तुझ्या गुणें रे काय उणे रे। भजन घडावे पूर्वपुण्ये रे।। 2।।
भक्तिभावें रे उध्दरावें रे। संसाराचे दु:ख विसरावे रे।। 3।।
'''भावार्थ =='''
या पदांत संत रामदास श्री रामाला विनंती करीत आहेत, मनाला रामभक्तीचा छंद लागावा,अंत:करणाला रामभेटीचा वेध लागावा, भजनाचा नाद लागावा .पूर्वपुण्य फळाला येऊन
भजनात तल्लीन व्हावे, रामाच्या गुणसंकिर्तनांत कांही उणे राहू नये त्यांत संसाराच्या सर्व दु:खांचा विसर पडावा.श्री रामांनी आपला उद्धार करावा.
'''पद ==76'''
पतितपावन रामा शिवमानस आराम।
सुखदायक निजधामा। पालक मुनिविश्रामा ।ध्रु0।।
करुणाकर सुरवरदा। पीयूषसमगुणहरदा ।
विलसत मणिमकरंदा। जयजयकार जगदानंदा ।।1।।
दुर्जनदुरितविदारा । दानवबलिसंहारा ।
शरयुपुलिनविहारा। जयजय जगदाधारा। ।।2।।
निगमागमसारांशा । कुलभूषण रघुवंशा ।
जगदोद्भव चालितांशा भव ईशा।। 3।।
कलितकलुषनिवारा। गुणगणिता अनिवारा ।
सहजसमाधी उदारा । दास मनोरमसारा ।।4।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास या पदांत श्री रामाच्या गुणांचे वर्णन करतात, त्यासाठी त्यांनी अनेक समर्पक विशेषणे वापरली आहेत.पतितपावन (पतितांचा उध्दार करणारा) शिव शंकराच्या मनाला आराम देणारा (शिवमानसआरामा) करुणामय, सुखदायक, योगीजनांना विश्राम देवून त्यांचे पालन करणारा, देवांना वर देणारा (सुरवरदा) जगाला आनंद देणारा (जगदानंद ) दुष्टांच्या पापवासना नष्ट करणारा ,
दानवांच्या बलशाली राजाचा संहार करणारा,शरयु तीरावर वास करणारा, जगताचा आधार, वेदांचे रहस्य जाणणारा, रघुवंशाचे भुषण,संसारचक्राला गतीमान करणारा, नाभीकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवाचा परमेश्वर, बोचणार्या पापाचे निवारण करणारा (कलितकलुषनिवारा) गुणांचा गौरव करणारा, योगीजनांना उदारपणे सहजसमाधी पर्यंत घेऊन जाणारा, अशा विविध गुणसंपन्न श्री रामाचे
हे सर्वच गुण अमृता प्रमाणे मधुर व चिरंतन आहेत. असे संत रामदास म्हणतात.
'''पद ==77''' (राग-शंकराभरण किंवा सारंग,ताल-दादरा )
जय जय रामा ।।ध्रु ।।
वारिजदळनयना। मुनिजनमनरंजना ।
तुजविण कंठवेना। रे रामा ।।1।।
सुखवरदायका। त्रैलोक्यनायका ।
भवबंधछेदका । रे रामा ।।2।।
दशरथनृपनंदना ।अरिकुळमुळखंडणा ।
रामदासमंडणा । रे रामा ।।3 ।।
'''भावार्थ ==='''
या पदांत श्री रामाचा जयजयकार करून संत रामदास म्हणतात, कमलफुलांच्या पाकळ्या प्रमाणे नेत्र असलेला श्रीराम मुनीजनांचे मनोरंजन करणारा, स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांचा नायक असून सुख प्रदान करणारा आहे. दशरथनंदन राम संसाराची बंधने छेदणारा असून शत्रुच्या कुळाचा समूळ नाश करणारा आहे. स्वामी श्री राम रामदासांचे भुषण आहे.
'''पद ==78'''
अहो जय रामा हो जय रामा ।। ध्रुव।।
पतितपावन नाम साजिरे।
ब्रीद साच दावीं आम्हां हा ।।1।।
दीनानाथ अनाथबंधु।
तुजविण कोण आम्हां हो ।।2 ।।
दास म्हणे नाम तारक तुझें।
बहुप्रिय तुझ्या नामा हो ।।3।।
'''भावार्थ ==='''
पतितपावन हे नाम श्री रामाला शोभून दिसते असे संत रामदास म्हणतात. पतितपावन हे नाम रामानी सार्थ करून दाखवावे, श्रीराम दिनाचा नाथ व अनाथांचा बंधु असून त्यांच्या शिवाय भक्तांना तारणारा कोणी नाही रामभक्तांना हे नाम अतिशय प्रिय असून ते राम नामाचा जयजयकार करतात.
'''पद ===79'''
कैपक्षी रघुनाथ । माझा।
दीनदयाळ क्रुपाळ क्रुपानिधि । मी एक दीन अनाथ।। 1।।
त्रिभुवनीं जो प्रगटप्रतापी। नामचि दीनानाथ।। 2 ।।
दास म्हणे करुणाघन पावन। देवाधिदेव समर्थ ।।3 ।।
'''भावार्थ==='''
रघुनाथ हा आपला पक्ष घेणारा असून तो दीनांवर दया करणारा क्रुपेचा सागर आहे. तिनही भुवनांचा स्वामी असून प्रतापी आहे. देवांचा अधिपती श्री राम समर्थ दीनानाथ आहेत.
'''पद ==80'''
हे दयाळुवा हे दयाळुवा ।
हे दयाळुवा स्वामी राघवा ।।ध्रुव।।
प्रथम कां मला लावली सवे।
मग उपेक्षणें योग्य हें नव्हे ।।1।।
सकळ जाणता अंतरस्थिति।
तरि तुम्हांप्रति काय विनंती ।।2।।
दास तूमचा वाट पाहतो।
बोलतां न ये कंठ दाटतो ।।3।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास श्री रामाकडे तक्रार करतात कीं, भक्तांच्या हाकेला धावून जाऊन मदत करण्याची सवय लावली आहे, आतां त्यांची उपेक्षा करणे योग्य नाही. अंत:करणातिल सर्व भावना श्रीराम जाणतात. भक्त रामांची काकुळतेने वाट पहातात .
'''पद ===81'''
दीनबंधु रे दीनबंधु रे दीनबंधु रे राम दयासिंधु रे।। ध्रु0।।
भिल्लटीफळें भक्तवत्सले । सर्व सेविलीं दासप्रेमळें।। 1।।
चरणी उध्दरी दिव्य सुंदरी। शापबंधनें मुक्त जो करी।। 2।।
वेदगर्भ जो शिव चिंतितो। वानरा रिसां गूज सांगतो।। 3।।
राघवीं बिजें रावणानुजें । करुनि पावला निजराज्य जें।। 4।।
पंकजाननें दैत्यभंजनें। दास पाळिलें विश्वमोहनें।। 5।।
'''भावार्थ ==='''
श्रीराम दयेचे सागर असून दिनाचे बंधु आहेत भक्त वत्सल रामांनी शबरी भिल्लिणीची उष्टी बोरे सुध्दां अत्यंत प्रेमाने सेवन केली. गौतम ऋषींच्या शापाने शिळा होऊन पडलेल्या दिव्यसुंदरी अहिल्येचा पदस्पशाने उद्धार केला. श्री राम वेद जाणणारे असून शिवशंकर श्री रामाचे सतत चिंतन करतात. आपले मनोगत वानरांना सांगून त्यांना आपलेसे करून घेतात, त्यांच्या मदतीने लंकापती रावणाचा वध करून रावणबंधु बिभिषणाला लंकेचे राज्य मिळवून देतात. कमलासारखे प्रसन्न वदन असलेले श्रीराम दैत्यांचा विनाश करुन विश्वाला मोहिनी घालतात.
'''पद ===82'''
एक वेळे भेटी दे रे ।।ध्रु0।।
प्रीति खोटी खंती मोठी। वाटते रे ।।1।।
विवेक येना विसर येना। काय करावे रे ।।2।।
तुझ्या वियोगें घटिका युग। जातसे रे ।।3।।
स्वरूप वेधू परम खेदु। वाटतो रे ।।4।।
भुवनपाळा दीनदयाळ। दास हे रे। ।।5।।
'''भावार्थ ='''
या पदांत संत रामदास दीनदयाळ रामचरणी व्याकुळतेने भेट देण्याची मागणी करीत आहेत. आपली रामावरची प्रिती खोटी तर नाही ना अशी शंका येऊन खंत वाटते . रामाच्या वियोगाने एक एक घटिका युगासारखी वाटते. राम स्वरुपाचा वेध लागला असून जीव कासावीस होऊन खेद वाटतो.
'''पद===83'''
शरण मी राघव हो ।।ध्रु0।।
अंतरध्याना गुणनिधाना। मज पहा हो।। 1।।
भजन कांहीं घडत नाही ।हें साहा हा ।।2।।
रामदास धरुनि कांस। एक भावो। ।।3।।
'''भावार्थ ==='''
मनासारखे भजन घडत नाही या जाणिवेने नाराज झालेले संत रामदास रामाला शरण जातात. अंत:करणांत ज्याचे सतत ध्यान करतो त्या रामाने आपल्यावर दया करावी एव्हढी एकच आस धरून भक्तीभावाने रामाला विनंती करतात.
'''पद===84'''
अरे तूं पावना रे ।।ध्रु0।।
चंचळ हे मन निश्चळवावें ।निरसी विपरित भावना रे।।
आशा ममता तृष्णा खाती। वारीं भवयातना रे ।।2।।
दास म्हणे शरणांगत तुझा । निश्चय माझा भावना रे।। 3।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास म्हणतात कीं, श्रीरामाने आपले चंचल (अचपळ) मन निश्चळ करावें. मनातील विपरित विचार निरसून टाकावेत.आशा, मीपणा आणि ममत्व तसेच प्रबळ इच्छा यांचा निरास करावा. शरण आलेल्याआपल्या दासाच्या भवयातना दूर कराव्यात.
'''पद ==85'''
धांव रे रामराया। किती अंत पाहसी।
प्राणांत मांडला कीं। न ये करुणा कैसी ।।ध्रु0।।
पाहीन धणीवरी। चरण झाडी केशीं।
नयन शिणले बा। आतां केधवां येसी ।।1।।
मीपण अहंकारें। अंगीभरला ताठा ।
विषयकर्दमांत। लाज नाही लोळतां।
चिळस उपजली। ऐसे जालें बा आतां ।।2।।
मारुतिस्कंदभागीं। शीघ्र बैसोनी यावे ।
राघवेंद्र वैद्यराजे। कृपा औषध द्यावे ।
दयेचा पद्महस्ता। माझे शिरी ठेवावे। ।।3।।
या भवीं रामदास। थोर पावतो व्यथा ।
कौतुक पाहतोसी। काय जानकीकांता ।
दयाळू दीनबंधो। भक्तवत्सल आतां। ।।4।।
'''भावार्थ =='''
संत रामदास अत्यंत आर्ततेने श्रीरामाला भेटीसाठी आळवित आहेत. अहंकाराने मनांत गर्विष्ठपणा शिरला आहे. इंद्रिय सुखाच्या चिखलात लोळत असूनही त्या बद्दल लाज वाटत नाही. श्रीरामाच्या भक्ती प्रेमामुळे आतां जागृती येत असून देहोपभोगाचा तिटकारा वाटत आहे. श्ररामाने आतां अधिक अंत न पाहतां मारुतीच्या खांद्यावर बसून त्वरित यावे,कारण वाट पाहून आतां डोळे शिणले आहेत.मनाची तृप्ती होईपर्यंत रामदर्शनाचे सुख घ्यावे,रामचरणाची धूळ आपल्या केसांनी झाडून काढावी अशी इच्छा सांगून संत रामदास विनंती करतात कीं, वैद्यराज रघुवीराने कृपा औषध द्यावे. दयेचा कमलहस्त मस्तकावर ठेवावा.जानकीनाथ दीनदयाळ दीनबंधु भक्तवत्सल रामाने आतां करुणा करावी.
'''पद===86'''
अहो जी रामराया ।। ध्रु0 ।।
बहुत शीण कठीण अपाया। निरस. दुर्घट माया।। 1।।
व्यर्थ प्रपंचें व्याकुळ काया। मार्ग नसेचि सुटाया ।।2।।
मावुनि गेलो जिवलग जाया। योग नव्हेचि भजाया।। 3।।
दुर्घट आला काळ कुटाया। सर्व सुख उतटाया ।।4।।
दास म्हणे मज बुध्दी कळाया। भक्तिमार्ग निवळाया।। 5।।
'''भावार्थ ==='''
हा प्रपंच्याचा व्यर्थ शीण असून देह व्याकुळ झाला आहे. यांतून सुटण्याचा कांही मार्ग सापडत नाही ,जिवाचे जिवलग ( पत्नी, संतती) ही प्रेमास पात्र नाहीत हे आतां समजले आहे.काळ कठीण आला आहे, सर्व सुख दु:खरुप बनले आहे. श्रीरामानी ही माया निरसून टाकावी, आत्मबुध्दी देवून भक्तीमार्गाला लावावें.
'''पद===87'''
रामा कल्याणधामा। क0
भवभयानक रंक पळाले। पूरित सकळ निष्कामा ।।1।।
दु:खनिरन सुखरूप सुखालय। सुखमुर्ति गुणग्रामा।। 2।।
दास विलास करी तव कृपा। अभिनव नामगरीमा।।3।।
'''भावार्थ ==='''
रामनाम हे कल्याणाचे निवासस्थान असून दु:खाचे निरसन करून सुखरूप करणारे सुखाचे भांडार आहे.रामनाम मूर्तिमंत सुख असून सर्व गुणांचे वस्तिस्थान आहे. भक्तांच्या संसारातील भयानक दारिद्र्य दूर करून मनोकामना पूर्ण करणारे आहे. रामनामाचा महिमा अभिनव आहे असे सांगत संत रामदास राम कृपेचा आनंद या पदांत व्यक्त करतात.
'''पद ===88'''
दयाळू राघवा हो ।।ध्रु0।।
तनु घननीळ सलिललोचन। मोचनदेव नमो।
कुंडलमंडित दंडितदानव। मानवदेव नमो ।।1।।
विधिहर सुंदर वंदिती सुल्लभ। दुल्लहदेव नमो
पालक दासविलासविभूषण। भूषणदेव नमो ।।2।।
'''भावार्थ ==='''
सावळी अंगकांती, कमलासारखे नयन असलेल्या दीनदयाळ राघवाला संत रामदास वंदन करीत आहेत. कानातील कुंडलांनी शोभून दिसणारा श्री राम दानवांचे निर्दालन करणारा मानवाचा देव आहे. ब्रह्मा आणि शिवशंकर ज्याला वंदन करतात त्या राघवाला नमस्कार असो. भक्तांचा आनंद हेच ज्याचे विभुषण आहे त्या भूषण देवाला नमस्कार असो .
'''पद===89'''
मांबुजाननं मांबुजाननं मांबुजाननं मांबु देहि मे ।।श्री।।
योगिरंजनं पापभंजनं। जनकजापतेविश्वमोहनं ।। 1।।
विबुधकारणं शोकहारणं। अरिकुलांतक भयनिवारणं।। 2।।
दासपालकं जय कृपालयं। चरणपंकजे देहि मे लयं।। 3।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास श्रीरामास मांबुजाननं असे संबोधन वापरतात. मांबुजाननं म्हणजे अमृतातून निर्माण झालेला. या राघवाकडे ते अमृताची मागणी करीत आहेत.योगीजनांचे रंजन करणारा, सीतास्वयंवरांत शिवधनुष्याचा छेद करणारा (जनकजापती) जनकराजाच्या कन्येचा पती, सर्व विश्वाला मोहिनी घालणारा, देवांचे दु:ख निवारण करण्यासाठी, देवांना निर्भय बनवण्यासाठी शत्रुच्या संपूर्ण कुळांचा नाश करणारा, अशा या रामाच्या चरणकमलाशी नतमस्तक होत आहेत.
'''पद ===90'''
अहो जी मुनिमानसधामा। परम सुखदायक रे।
तुजविण सीण वाटतो रे। जानकीनायका रे ।धृ।।
मायामोहपुरीं वाहवलो दुरीं। तूं धाव धाव देवराया ।
कामक्रोधमदमत्सरमगरें। विभांडिली सर्व काया।। 1।।
नको लावू वेळु तूं दीनदयाळू ।तुझी मन वास पाहे।
येथून सोडवी ऐसा ।मज तुजविण कोण आहे ।।2।।
नको धरू दुरीं नाहीं देहा उरी। किती सत्व पाहसी रे।
रामदास म्हणे झडकरी धांवणें ।राहें मज मानसी रे ।।3।।
'''भावार्थ ==='''
तपस्वी मुनींचे मन हे ज्याचे विश्रांतीस्थान आहे अशा परम सुखदायक जानकीनायकाला संत रामदास साद घालत आहेत. माया व मोह यांनी व्यापलेल्या संसार सागरात वाहून जाणार्या दासाला राघवाने धांव घेऊन वाचवावें. काम क्रोध, मद, मत्सर हे षड़रिपु भयानक मगरीच्या रूपांत या देहाची चिरफाड करीत आहेत. श्रीराम दीनदयाळ असून दासांचे एकमेव तारणहार आहेत. भक्ताची सत्वपरिक्षा न पाहतां आतुरतेने वाट पहात असलेल्या रामदासांना तात्काळ सोडवावे.
'''पद ===91'''
राम माझ्या जीवींचे जीवन। राम माझ्या मनींचे मोहन।
एक वेळ भेटवा हो। तनमनधन सर्वही अर्पीन राघव दाखवा हो।।ध्रु0।।
घालूनि आसन लावूनि नयन चितासी चिंतवेना ।
मीपणे मी मज पाहतां निज परमगुज तर्कवेना।। 1।।
जवळीं आहे संग न साहें। कोणा न चोजवे तो।
रामदास म्हणे आत्मनिवेदनें राघव पाविजेतो ।।2।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास म्हणतात, आत्मनिवेदन भक्तीने (संपूर्ण शरणागती) राघव प्रसन्न होतो. पद्मासन घालून मन अंत:करणांत स्थिर करुन श्री रामाचे चिंतन करण्याचा प्रयत्न करुनही देहबुध्दीमुळें परमेश्वरी साक्षात्काराचे रहस्य तर्कशक्तीने जाणता येत नाही. परमेश्वर आपल्या अगदी जवळ असूनही त्याचा संग लाभत नाही.मनाला मोहिनी घालणारा, जीवांचे जीवन असा श्रीराम एकवेळ भेटला तर तनमनधन रामचरणी अर्पीन .
'''पद===92'''
श्रीहरी नारायणा। तुज कां नये करुणा।
वेळोवेळां जन्मवीसी। आतां सांगावें कोणा ।।ध्रु0।।
कैसा तरि तुझा अंश। तरि कां कराची उदास।
करुणाघन कैसा। किती आतां पहावा वांस ।।।1।।
बहुतांमुखें ऐकलासी। भक्तवत्सल होसी ।
तरि कां उदासीन होसी । किती सत्व पाहसी ।।2।।
पावला दीनानाथ। भक्तांच्या केलें सनाथ ।
त्रैलोक्य वर्तवितो । धन्य होय समर्थ ।।3।।
'''भावार्थ ==='''
जन्म मृत्युच्या चक्रांत सापडलेल्या भक्तांची श्रीहरीनारायणाला करुणा येत नाही. नारायणाचे सर्व भक्त हे त्याचेच अंश असूनही तो आपल्या भक्तांना उदास कां करतो असा प्रश्न विचारून संत रामदास म्हणतात कीं, नारायणाला करुणाघन कसे म्हणावे. पुष्कळदा ऐकलं आहे कीं, श्रीहरि भक्तवत्सल आहे तरी भक्तांबद्दल ईतकी उदासिनता कां असावी, तो भक्तांचे ईतके सत्व कां पहातो या प्रश्नांनी बेचैन झालेले संत रामदास म्हणतात, त्रैलोक्य चालवणारे, समर्थ श्रीराम धन्य होत कारण ते दीनानाथ असून भक्तांना सनाथ बनवतात.
'''पद===93''
काय करूं मज कंठत नाही।
भोगविलास न मानत कांहीं ।। ध्रु0।।
घर उदासीन राम उदासीन।
मन उदासीन होतचि आहे ।।1।।
बहुत तमासे सृष्टीत भासे।
देखत त्रासे अंतर माझें ।। 2।।
दास म्हणे रे कर्ता पाहें
शोधित आहे मन तयाला ।।3।।
'''भावार्थ ==='''
संत रामदासांच्या मनाला जाळणारी उदासिनता प्रकर्षाने व्यक्त झाली आहे. भोगविलासात मन रमत नाही.एक एक दिवस घालवणे कठिण वाटते.घर रानासारखे उदास वाटते त्यामुळे मन आधिकच उदास बनते. सृष्टीत घडणाऱ्या घटना बघून मनाला त्रास होतो. संत रामदास म्हणतात, या घटना घडवणार्याला मन शोधात आहे.
'''पद ===94'''
आजीं भेटे गे रघुवीर। मी तुझे धाकुटें बालक।
भवधूशरें भरले माझें पुसी वो श्रीमुख। ।।ध्रृ0।।
माझे जीवींचा जिव्हाळा सखा जिवलग सांगाती।
आजीं भेटे रघुवीर माझ्या बाह्या स्फुरती।। 1।।
आजीं कंजती साळ्या माझे लवती लोचन।
आजीं भेटेल रघुवीर सुखदु:ख सांगेन।। 2।।
रामीरामदासीं नित्य होताती शकुन।
बाह्यांतरीं निज भेटि हितगुज सांगेन ।।3।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास स्वता:ला रघुवीराचे छोटे बालक आहे असे समजून लडिवाळपणे विनंती करीत आहेत.संसारातील अनिश्चितता, नश्वरता यांच्या धुळीने माखलेल्या आपल्या श्रीमुखाला रघुवीराने पुसून स्वच्छ करावे. रघुवीर आपल्या जीवाला जिव्हाळा देणारा जिवलग सखा, सांगाती आहे, त्यांच्या भेटीसाठी आतुरलेल्या मनाला शुभ शकुन होत असून रामदासांचे बाहू स्फुरत आहेत, डोळे लवत आहेत,कंठ दाटून येत आहे. रघुवीराची भेट होताच त्यांच्याशी हितगुज करून त्यांना मनातील सर्व सुखदु:ख सांगेन असे संत रामदास म्हणतात.
'''पद ===95'''
कमलदलनयना चाल हरी ।। ध्रु0।।
सकलपालका अतंरचालका। कठिणता न करीं ।।1।।
दीनदयाळा भक्तवत्सला।दूरि दुरी न धरीं ।।2।।
रामदास म्हणे आतां तुजविण। उदास वाटे तरी।। 3।।
'''भावार्थ ==='''
सर्वांच्या अंत:करणांत वास करून प्रेरणा देणार्या, सर्व जीवांचे पालन करणार्या रघुवीराने मन कठोर न करता,दुरावा न धरता दयाळू पणे, वात्सल्याने भक्तांना आपलेसे करावे. कमलनयन श्रीहरीने आता तत्परतेने भेटी द्यावी कारण त्याच्याशिवाय आतां उदास वाटत आहे.
'''पद===96'''
कल्याण करी देवराया। जनहित विवरीं ।।ध्रु0।।
तळमळ तळमळ होतचि आहे। हे जन हातीं धरीं।। 1।।
अपराधी जन चुकतचि गेले। तुझा तूंचि सांवरीं ।।2।।
कठीण त्यावरि कठीण जालें। आतां न दिसे उरी ।।3।।
'''भावार्थ ==='''
सतत चुका करणार्या अपराधी लोकांकडे पाहून संत रामदासांच्या मनाची तळमळ होत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती कठिण होत असून ती सुधारण्याची कांही लक्षण दिसत नाही. देवरायाने जनहिताचा विचार करून त्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे कल्याण करावे अशी विनंती संत रामदास या पदांत करीत आहेत.
'''पद ===97'''
नावरे निरंतर मन हें अनावर।
आवरीं सत्वर देवराया रे ।।ध्रु 0।।
माझीच पारखी मज। म्हणोनि शरण तुज।
शरणांगताची लाज राख रे रामा ।।1।।
तुझिया रंगणीं मन। धरितें अभिमान।
तयारी निर्वाण करीं देवा रे ।।2।।
रामीरामदासी भाव। धरता प्रगटे देव ।
मनाचा स्वभाव पालटावा रे ।।3।।
'''भावार्थ ==='''
आपलेच स्वरुप आपल्याला समजू शकत नाही. आपणच आपल्याला परके झाले आहोत आणि आपल्यास्वरुपाची ओळख होण्यासाठी संत रामदास श्री रामाला शरण जात आहेत व श्री रामांनी शरणागताची लाज राखावी अशी विनंती करतात. रामचरणीं गुंतलेले मन अभिमान विसरु शकत नाही. संत रामदासांचा रामचरणीं उत्कट भक्तिभाव असल्याने देवाने प्रत्यक्ष दर्शन देवून मनातील अहंकार दूर करून स्वभाव पालटावा.
'''पद===98'''
पाळिलें पोसिलें मज। काय रे म्यां द्यावे तुज।
चालविले हितगुज। कृपाळुपणें सहज। ।। ध्रु ।।
धन्य तूं गा रघोत्तमा। काय द्यावी रे उपमा।
सुखाचिया सुखधामा। मज न कळे महिमा ।।1।।
आठवितां कंठ दाटे । हृदय उलटे फुटे।
नयनीं पाझर सुटे। बोलता वचन खुंटे ।।2।।
सोडविले ब्रह्मादिक। तूं रे त्रैलोक्यनायक।
दास म्हणे तुझा रंक ।सांभाळीं आपुले लोक ।।3।।
'''भावार्थ ==='''
श्री रामाने कृपा केल्याने आपले पालन पोषण झाले त्यांनी कृपाळुपणे सहज हितगुज केले त्यांचे कसे उतराई व्हावे हे समजत नाही असे सांगून संत रामदास म्हणतात श्री राम हे सर्व सुखाचे धाम असून ते अनुपमेय आहेत. त्यांचा महिमा कसा वर्णन करावा हे कळत नाही. श्रीरामांचे स्मरण होताच कंठ दाटून येतो, हृदयाला पाझर फुटून नयनावाटे पाझरु लागतो, बोलतांना वाणी कुंठित होते. श्री राम स्वर्ग, पृथ्वी, नरक या तिन्ही लोकांचे स्वामी असून त्यांनी ब्रह्मादिक देवांची कारागृहातून सुटका केली. आपण दीन असून श्री रामांनी आपला सांभाळ करावा अशी
मागणी संत रामदास करीत आहेत.
'''पद===99'''
सुंदर पंकजनयना। पुण्यपावना ।
चुकली संसारयातना। जन्मपतना ।।ध्रु0।।
तुजविण शीण होतसे। वय जातसे।
काळ सकळ खातसे । जन भीतसे ।।1।।
दास म्हणे तुझा आधार। पाववी पार।
करी दीनाचा उद्धार। जगदोध्दार ।।2।।
'''भावार्थ ==='''
जन्म मरणाच्या फेर्यांत अडकून संसाराच्या यातना सोसून थकून गेलेले संत रामदास कमला सारखे सुंदर नयन असलेल्या, पुण्यपावन श्री रामाला प्रार्थना करीत आहेत.जीवनातिल एक एक दिवस काळाच्या मुखी पडत आहे. मृत्यूचे भय सतत भेडसावत आहे, या वेळी केवळ रामकृपेचाच आधारवाटतो. जीवनाची ही नौका श्रीरामाने पार करावी .दिनाचा उद्धार करून जगदोध्दार करावा .
'''पद ===100'''
तूं माझी माता।राघवा । तूं माझा पिता ।।ध्रु0।।
मारुतीचे स्कंधभागीं ।बैसुनियां येईवेगीं । धांव त्वरित आतां ।।1।।
दीनबंधु नाम तुझें। मजविषयीं कां लाजे। जानकीच्या कांता ।।2।।
पतित मी देवराया। शुध्द करावी हे काया। कर ठेउनि माथां ।।3।।
हस्त जोडुन वारंवार। दास करी नमस्कार। चरणी ठेउन माथा ।।4।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास श्री रामाला आपली जन्मदात्री माता व पालन पोषण करणारे पिता आहेत असे मानतात. त्यांच्या चरणावर माथा ठेवून त्यांना वारंवार नमस्कार करतात. जानकीनाथ श्री राम हे दीनबंधु या नावाने ओळखले जातात तरिही ते आपल्या दासाबद्दल उदासीन आहेत. देवरायाने आपल्या मस्तकावर हात ठेवून या पतिताची काया शुध्द करावी. वारंवार हात जोडून, चरणांवर माथा ठेवून संत रामदास देवाची प्रार्थना करतात.
'''पद ===101'''
तूं ये रे रामा। कायवर्णुं महिमा ।।ध्रु0।।
सोडविले देव तेतीस कोटी। तेवीं सोडवीं आम्हां।। 1।।
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न। पुढें उभा हनुमान ।।2।।
दास म्हणे भावबंध निवारीं । रामा गुणधामा ।।3।।
'''भावार्थ ==='''
श्री राम हे सर्व गुणांचे आश्रयस्थान असून ते लक्षुमण,भरत, शत्रुघन व हनुमान या समवेत उभे आहेत. श्रीरामांनी तेतीस कोटी देवांची रावणाच्या कारागृहातून सुटका केली तसे त्यांनी या भवबंधनातून आपणास सोडवावे अशी कळकळीची विनंती संत रामदास श्री रामाला करतात.
'''पद===102'''
आम्ही आपुल्या गुणणें। भोगितों दु:ख दुणें।
तुज काय शब्दठेवणें। लाताडपणें ।।ध्रु0।।
सुख भोगितां सदा। नाठवे देव कदा।
तेव्हां भुललों मदा ।भोगूं आपदा ।।1।।
जाणत जाणतचि। बुध्दी करुनी काची ।
धांवती संसाराची। सेवटीं ची ची ।।2।।
प्रस्ताव घडला। सर्व कळों आला।
आतां सांगावें कोणाला। चुका पडिला ।।3।।
दास म्हणे रे देवा। चुकलों तुझी सेवा।
माझा केतुला केवा । रे महादेवा ।।4।।
'''भावार्थ ==='''
आपण आपल्याच अवगुणांमुळे दु:ख भोगतो पण दोष मात्र देवाला किंवा दैवाला देतो .सुख भोगतांना मात्र देव आठवत नाही, तेव्हां मनांत अहंकार असतो. परिणामी आपदा भोगाव्या लागतात. लोकांकडून निंदा नालस्ती ऐकावी लागते. नंतर केल्या कर्माचा पश्चाताप होतो. घडून गेलेल्या सर्व चुकांची जाणिव होते पण ते कुणालाच सांगता येत नाही. संत रामदास म्हणतात देवाची सेवा करण्यात कुचराई केल्याने हे सर्व भोगावे लागते.
'''पद===103'''
कानकोंड्या सुखाकारणे मने लुलु केली।
तेणें देहा सुख नव्हे हळहळ जाली ।।ध्रु0।।
कृपासिंधु रघुनायका अव्हेरूं नको रे ।
शरण रविकुळटिळका दास दीन मी रंक रे। ।।1।।
तुझी भेटी येतां रामा तुझा मार्ग चुकलों।
विषयकांटे रुतले तेणे सीण पावलों ।।2।।
ऐसा दगदला देखोनि रामा करूणा आली।
तंव वैराग्यहनुमंतें पुढें उडी घातली ।।3।।
हा हनुमंत ज्याचा कोंवसा धन्य त्याचें जिणें।
तयालागीं ज्ञान बापुडें लाजिरवाणें ।।4।।
रामदास रामदास्यें रामभेटीस गेला।
मीपण सांडुनी रामचि होउनि ठेला ।।5।।
'''भावार्थ'''
अतिशय क्षुल्लक सुखासाठी मन लांचावले. त्यामुळे सुख नव्हे तर विषाद मात्र वाढला. कृपासिंधु रघुनायकाने अव्हेर करु नये. राघवाचा आपण एक अत्यंत दीन असा दरिद्री दास असून त्याच्या भेटीसाठी आतुरलो आहे पण मार्ग चुकल्याने विषयसुखाच्या काटेरी मार्गावरील काट्याकुट्यांनी जखमी झालो,शिणून गेलो. हे पाहून रामाला दया आली. त्या वेळी विरागी हनुमंत मदतीस आला. व संत रामदासांना रामभेटीचा सुलभ मार्ग रामभक्त हनुमानाने दाखवला. संत रामदासांचा मीपणा हरपून ते राघवाशी एकरुप होऊन राममय झाले.
'''पद ===104'''
माझे जीवींचा सांगात। माझे मनांचा सांगात।
भेटी घडो अकस्मात ।।ध्रु0।।
पावन तो रे आठवतो रे। गळत ढळत अश्रुपात।। 1।।
कोण तयाला भेटवि त्याला। निकटमनें प्राप्त।। 2।।
दास उदासिन करितों चिंतन। पावन ते गुण गात।। 3।।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास उदासिन मनाने आपल्या जीवींचा, मनांचा जो सांगाती आहे त्या श्री रामाची अकस्मात भेट घडावी अशी इच्छा व्यक्त करीत आहेत. पीडितांना पावन करणारा श्री राम आठवतांच डोळ्यातून अश्रुपात सुरु होतो. जो कोणी त्या करुणाघन रामाला भेटवील त्याला मनापासून नमस्कार असो असे संत रामदास म्हणतात.
'''पद===105'''
आम्हां भक्तांच्या काजा । कैंपक्षी रघुराजा ।।ध्रु0।।
काय आहे मां तें द्यावें। कैसें उत्तीर्ण व्हावें ।।1।।
दास म्हणे धन्य लीळा। जाणें सकळ कळा।। 2।।
'''भावार्थ ==='''
रघुराजा भक्तांचा कैपक्षी असून तो त्यांच्या कामना पूर्ण करतो.रघुराजाच्या या उपकारासाठी कसे उतराई व्हावे, त्यांना काय अर्पण करावे असा प्रश्न करून संत रामदास म्हणतात, रघुराजाची लीळा अगाध आहे, तो सर्व कांही जाणतो.
'''पद===106'''
अहंतेने भुलविलों ज्ञानाचेनि द्वारें।
धांव देवा नागविलों अभिमान चोरें ।
उमस नाहीं येते मीपणाचें काविरें।
प्रकाश मोडला भ्रांत पडली अंधारें ।।1।।
बहु श्रवण घडले ज्ञाता होउनिया ठेलों।
सिध्दपणाचा ताठा अंगी घेऊनि बैसलों।
बोले तैसे चालवेना मीच लाजलों।
शब्दज्ञानकाबाडी ओझें वाहातचि गेलों ।।2।।
शब्दज्ञान डफाचें गाणें आवडते भारी।
देहबुध्दीचें कुतरें मी दुसऱ्याचें नावारी।
ज्ञातेपणें फुंज भरला माझें अंतरी।
रामदास म्हणे आतां नि:संग करी ।।3।।
'''भावार्थ ==='''
ज्ञानामुळे मीपणा (अहंता) निर्माण झाली,अभिमान रुपी चोराकडून पुरती फसवणुक झाली. मीपणाच्या धुंदीनें उसंत मिळेनासी झाली ,ज्ञानदीप प्रकाश निमाला आणि भ्रांतीचा अंधार पसरला. श्रवण
भक्तीने ज्ञानलाभ झाला आणि ज्ञाता बनलो. सिध्द पुरुष म्हणुन ओळखला जाऊ लागलो, त्या मुळे गर्व निर्माण झाला, वाचा आणि वर्तन यांची फारकत झाली. स्वता:ला स्वता:ची लाज वाटू लागली. शब्दज्ञानाची पोपटपंची करु लागलो. शब्दज्ञानरुपी डफाचे गाणं आवडू लागलं, दुसऱ्याच्या देहबुध्दीचा उपहास करु लागलो. ज्ञातेपणाचा गर्व मनांत भरून राहिला. संत रामदास श्रीरामाला शरण
जाऊन आपणास नि:संग करावे अशी प्रार्थना या पदातून करीत आहेत.
'''पद===107'''
गोडी लागली रामीं। न गुंतत कामी हो।। श्री।।
कनक मंदिरे सांडुनि सुंदरें विजन सेवियेलें।
त्यजुनि सुंदरी वसविली दरी चरण भावियेले।। 1।।
शुक सनकादिक नारद तुंबर आर्षभादि मुनिराज।
दास उदासिन होऊनि विचरति सांडुनि राजसमाज।। 2।।
'''भावार्थ ==='''
रामभक्तीत तल्लीन झालेले मन निष्काम बनले. सोन्यासारखा घर संसार सोडून विजनवास स्विकारला, सुंदर स्त्रीचा त्याग करून गिरीकंदरीं रामचरणीं लीन झालेले शुक सनकादिक ऋषी ,नारद,तुंबर, आर्षभ मुनिंनीं राम चरणाचा आश्रय घेतला.संत रामदास उदासिन होऊन समाज,राजाश्रय यांचा त्याग करून विजनवासात रामभक्तीत रममाण झाले.
'''पद===108'''
देह दंडिसी मुंड मुंडिसी। भंड दाविसी नग्न उघडा।।1।।
भस्मलेपन तृणआसन। माळभूषण सोंग रे मूढा।। 2।।
अन्नत्याग रे हट्टयोग रे। फट्ट काय रे हिंडसी वनीं।। 3।।
ऐक सांगतो रामदास तो। ज्ञानयोग तो साधितां भले।। 4।।
'''भावार्थ==='''
तपश्चर्या करून देहदंडन करणे, डोक्यावरील केस कापून मुंडन करणे, भगवी वस्त्रे परिधान करणे, सर्वांगाला चिताभस्म फासणे, तृणासन, रुद्राक्षाच्या माळा ही सर्व मुर्खांची लक्षणे आहेत. अन्नत्याग, विजनवास हा हठयोग आहे. संत रामदास म्हणतात, यांतून खरे वैराग्य निर्माण होणार नाही. ज्ञानातून वैराग्याचा उदय होतो. ज्ञानयोग साधणे अधिक श्रेयस्कर आहे.
'''पद===109'''
संसारी शिणसी थोर। कोणास उपकार।
राहिला ईश्वर। तेणें गुणें रे ।।ध्रु0।।
संसारी शिणोनि काय। सज्जना शरण जाय।
पावती उपाय। रामसोयरे ।।1।।
सांडून आपुले हित। धरिले गणगोत।
गेले हे जीवित। हातोहातीं रे ।।2।।
म्हणे रामीरामदास। आता होईं उदास।
धरी रामकास। सावकाश रे ।।3।।
'''भावार्थ ==='''
आपले हित सोडून नातेवाईक, सगेसोयरे यांच्या साठी काळ घालवल्यास सारे जीवन व्यर्थ जाते.संसारात अपार कष्ट केले तरी कोणावर उपकार केला असे होत नाही.परंतु त्यांमुळे ईश्वराला मात्र अंतरतो.यापेक्षा संत सज्जनांना शरण जाऊन निष्काम मनाने,उदासीन वृत्तीने,शांतपणे रामभक्तींत लीन व्हावे.
'''पद===110'''
मूर्खांची संगती कामा न ये रे।
उपायांचा होतसे अपाय रे ।।ध्रु0।।
विकारी ते भिकारी बराडी रे।
त्यांचे संगतीचा जनीं कोण गोडी रे ।।1।।
वैराग्याची वृत्ति ते उदास रे ।
तेथें न दिसती आशापाश रे ।।2।।
वासना ओढाळ आवरावी रे ।
विषयबुध्दी ते सावरावी रे ।।3 ।।
बोलणें चालणें उदासीन रे।
अनुतापें सकळांसी मान्य रे ।।4।।
रामदास म्हणेसांगगों काय रे ।
मूढासी तो आवडें अन्याय रे ।।5।।
'''भावार्थ ==='''
मुर्खांची संगती धरल्यास उपाय न होतां अपायच होतो. सदाचार सोडून वागणारे विकारी लोक भिकारी समजावेत, त्यांच्या संगतीत समाधान मिळत नाही. विरागीवृत्ती असलेले लोक आशा निराशेच्या बंधनापासून मुक्त असतात. विषयसुखांना आवर घालून बोलणे व चालणे यांत उदासीनता असावी. अनुतापाने मन शुध्द होऊन सर्वत्र मान्यता मिळते. संत रामदास म्हणतात, असा उपदेश मूर्ख लोकांना अन्याय वाटतो.
'''पद===111'''
भावबळे तरले। रे मानव ।।ध्रु0।।
सारासार विचार विचारुनि । भव हा निस्तरले रे ।।1।।
रामनाम निरंतर वाचे। निजपदिं स्थिरले रे ।।2।।
दास म्हणे सुखसागरडोहीं । ऐक्यपणें विरले रे ।।3।।
'''भावार्थ ==='''
उत्कट भक्तिभाव असल्याने मानव सहजपणे संसार सागर तरून जातात. रामनामाचा सतत जप केल्याने भक्त आत्मपदीं स्थिर होतात. सार व असार यांचा निवाडा करून जन्म मृत्युच्या फेरा चुकवून आत्मस्वरुपाशी एकरुप होऊन आत्मानंदीं तल्लीन होतात. असे संत रामदास या पदात सांगतात.
'''पद===112'''
भावची दृढ जाला। हरी सन्निध त्याला ।। धृ0।।
वर्णावर्ण स्री शूद्रादिक। धरितां नामरतीला ।।1।।
प्रेमभरें हरिकीर्तनी नाचत। लाजविलें लाजेला ।।2।।
रामीं दासपणाचा आठव। सहजीं सहज विराला ।।3।।
'''भावार्थ ==='''
ज्याचा भक्तिभाव हरिचरणी दृढ झाला त्याला हरी नेहमीच सन्निध (जवळ) आहे. हरीच्या नामाचा सतत जप करणाऱ्रा साधक वर्णभेद, लिंगभेद, जातीभेद या पलिकडे असतो. भक्तिप्रेमाने हरिकिर्तनांत दंग होऊन नाचणारा भक्त आणि राम एकरुप होतात .
'''पद ===113'''
रघुनाथ अनाथ सनाथ करितो। मुक्त सदाशिव काशी।
दोष विशेष नि:शेष नासती। नाम स्वर्गपदवासी ।।धृ0।।
नर वान्नर जळचर शरणांगत दीन अनाथ।
खेचत भूचर जीव निशाचर तारिले भुवननाथें ।।1।।
रघुराज विराज विराजित ब्रीद दैत्यकाळमद राहे।
वाजत गाजत साजत वांकी काय कोण महिमा ।।2।।
दास उदास सदा समबुद्धी विषमबुध्दि असेना।
राम आराम विराम विराम तेणेविण वसेना। ।।3।।
'''भावार्थ ==='''
रघुनाथ अनाथांचा नाथ होऊन त्यांना सनाथ करतो. विशेष दोषांचे समूळ उच्चाटन करतो.रघुनाथाचे नामस्मरणाने स्वर्गपदाची प्राप्ती होते. श्रीराम तिन्ही भुवनाचे स्वामी असून नर, वानर, जळचर, शरण आलेले दीन अनाथ यांनाच नव्हे तर आकाशात तसेच जमिनीवर राहणारे, रात्री संचार करणारे निशाचर या सर्वांना भुवनेश्वर रघुनाथ तारून नेतात. रघुनाथ दैत्यांचा गर्व हरण करून आपले ब्रीद राखतात. त्यांच्या नामाचा डंका त्रिभुवनांत वाजत गाजत असतो. सदा समबुध्दी असलेले संत रामदास म्हणतात,श्री राम सर्वांना आराम देणारे असून त्यांच्या कृपेशिवाय विराम (विश्रांती) मिळत नाही.
'''पद===114'''
राम करी सांभाळ। दिनांचा ।। धृ0।।
सुरवर मुनिवर योगी विद्याधर। रीस हरी प्रति पाळ ।।1।।
सुरपति नरपति अवनिसुतापति।रामदासीदयाळ।। 2।।
'''भावार्थ ==='''
श्रीराम दीन,पतित यांचा सांभाळ करतात. योगी, विद्याधर यांचा प्रतिपाळ करतात.रामदासांवर दया करणारे श्रीराम मानवांचे,देवांचे देव असून अवनीसुता सीतेचे पती आहेत.
'''पद===114'''
करुणाकर अंतर जाणतसे ।।धृ0।।
न बोलतां जनीं भाविक भजनी। संकट वारितसे।। 1।।
भक्तवेळाइत सगुण अनंत। भाविकां रक्षितसे ।।2।।
दास जनीं वनिं चिंतित चिंतनीं। अंतरिं जो विलसे ।। 3।।
'''भावार्थ ==='''
करुणा करणारे ,दयासागर श्रीराम सर्वांच्या अंतकरणातिल भाव जाणतात. ते मूकपणे भाविक भक्तांच्या संकटांचे निवारण करतात. भक्तांसाठी निर्गुणातून सगुणांत अवतरलेले श्री राम अनंत रूपे घेऊन भक्तांचे रक्षण करतात. देव भक्तीप्रेमामुळे भक्तांचे ऋणी (अंकित) असतात असे संत रामदास म्हणतात.
'''पद ===115'''
माझी चिंता मज नाहीं रे। ।।धृ0।।
भक्तजनांचा भारचि वाहे। मज नलगे कांहीं। ।।1।।
पापविनाशन संकटनाशन। पावतसे लवलाहीं ।।2।।
दास म्हणे भवपाश तुटाया। संशय नलगे कांहीं ।।3।।
'''भावार्थ ===='''
भक्तजनांचा भार वाहून नेणारे श्रीराम स्वता:बद्दल अत्यंत उदासीन, निश्चिंत आहेत. सर्व पापांचा नाश करून भक्तांना संकटातून सोडवतात. भाविकांची संसार बंधनातून मुक्तता करतात यांत कांहीच संशय नाही असे संत रामदास म्हणतात.
'''पद===116'''
हरि कल्याणकारी। दु:ख शोक निवारी ।।धृ0।।
तो जगजीवन तो मनमोहन ।ओळखितां जन तारी।। 1।।
दास म्हणे तो अंतर माझें। भिन्नभेद अपहारी ।।2।।नृ
'''भावार्थ ==='''
सर्व सजीव सृष्टीला जीवन प्रदान करणारा, मनमोहन श्री हरि कल्याणकारी असून संसार दु:खांचा निरासकरणारा आहे. संत रामदास म्हणतात, श्री हरीआपला अंतरात्मा आहे हे ओळखल्यास आपपर भाव न ठेवता भेदाभेद नाहिसे करतो.
'''पद===117'''
भजा भक्तवत्सल। तो भगवान ।।ध 0।।
पावेल किंवा न पावेल ऐसा। सोडून द्या अनुमान।। 1।।
भजनरहित सकळ आडवाट। घेऊं नका आडरान ।।2।।
संचित तें भरले तन तारूं। मारिल काळ तुफान।। 3।।
एक देव तो दृढ धरावा। वरकड काय गुमान ।।4।।
दास म्हणे मज कोणीच नाहीं ।त्याचे पाय जमान।। 5।।
'''भावार्थ ==='''
भगवान भक्तवत्सल आहे तेव्हां तो आपल्याला पावेल कीं नाही अशी शंका घेऊ नये. भगवंताचे भजन करण्याचा मार्ग सोडून वेगळ्या आडवाटेने जाऊन आडरानांत (संकटात) शिरु नये. प्रत्येकाला त्याच्या संचिताप्रमाणे देहप्राप्ती होते व काळाच्या तुफानांत देहनाश होतो. एका देवावर दृढ निष्ठा ठेवून बाकी क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देवू नये. संत रामदास म्हणतात, आपणास भगवंताशिवाय कोणी नाही, त्यांच्या चरणांवर जीवन वाहिले आहे, भगवंताचे पाय याची साक्ष देतील.
'''पद===118'''
हरि जगदांतरीं रे। हेत बरा विवरीं रे ।।धृ0।।
सकळ तारी सकळ मारी। सकळ कळा विवरी ।।1।।
चाळितसे रे पाळितसे रे। दास म्हणे विलसे रे।। 2।।
'''भावार्थ ==='''
श्रीहरी जगताचा अंतरात्मा आहे या बोधवचनाचे मनांत सतत विवरण करावें. सर्वांना तारणारा किंवा मारणारा, सर्व सजीवांना चलनवलन देवून पालन करणारा केवळ हरीच आहे. जगात घडणाऱ्या सर्व घटना भगवंताचा लीला विलास आहे. असे संत रामदास या पदांत म्हणतात.
'''पद=119'''
श्रोतीं असावें सावध।
तेणें गुणें अर्थ होतसे विशद ।।धृ।।
श्रोते श्रवणमननें।
मननशीळ होती सुचित मनें ।।1।।
वाच्यांश सांडिला मागें ।
लक्षांश पुढे भेदिला लागवेगें ।।2।।
तिन्ही पाहाव्या प्रचिती।
प्रचितीविण कदापि न घडे गति ।।3।।
दास म्हणे रे भावे।
श्रोते तुम्ही समाधान असावें ।।4।।
'''भावार्थ ===='''
श्रोत्यांनी श्रवण करतांना मनाने एकाग्र असावें. ऐकलेल्या गोष्टींवर विचार करून मनन केल्यानें शब्दार्थ कळून भावार्थ सुध्दा समजतो. श्रवण, मनना नंतर प्रत्यक्ष अनुभव घेणे आवश्यक असते. त्यां शिवाय परमार्थात प्रगती होत नाही. संत रामदास म्हणतात, भक्तिभावाने मनन केल्यास परमार्थात प्रगती होते.
'''पद===120'''
धरीं धीर राहें स्थिर अरे तूं मना। अरे।
क्षणभरी तरी आठवी रघुनंदना ।।धृ0।।
चंचळ चपळ मन हें नाटोपे कोणा।
सृष्टीकर्ता ब्रह्मा तोही नाडला जाणा ।।1।।
हाचि समय टळल्यां मग कैंचा श्रीराम।
स्मरणीं सावध होई माझा फिटेल भ्रम ।।2।।
सांवळा सुंदर राम कोदंडधारी।
परेहूनि परतां रामदासाअंतरीं ।।3।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास आपल्या मनाला उपदेश करीत आहेत. मनाने स्थिर राहून धीर धरून राघवाचे स्मरण करावें. मन अतिशय चंचल, चपळ असून मनाला आवर घालणे सृष्टी निर्माण करणार्या
ब्रह्मदेवाला सुध्दा शक्य होत नाही. ही वेळ निघून गेल्यावर श्रीरामाचा लाभ होणार नाही. श्रीराम कृपेचा लाभ होण्यासाठी रामनामांत सावध असले पाहिजे.सावळा सुंदर राम परावाणीच्या पलिकडे असून तो रामदासांच्या अंतरंगात वास करतो.
'''पद===121'''
रे राघवा नाम तुझें बरवें ।।धृ0।।
ज्ञानें गर्व चढे। अहंभाव वाढे।
स्थिती मोडे वैभवें ।।1।।
कर्म आटाआटी। प्रायश्चितांच्या कोटी।
संशय घेतला जीवें ।।2।।
दास म्हणे आतां। नाना पंथी जातां।
काय किती पहावें ।।3।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास म्हणतात, ज्ञानामुळे मनाला गर्वाची बाधा होते मीपणा वाढतो.वैभव आले कीं, संसारिक स्थिती बदलते. कर्म करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.दुष्कर्माचे प्रायश्चित्त घ्यावे लागते. जीव उपासनेच्या नाना पंथांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. या पेक्षा रामाच्या नामस्मरणाचा मार्ग अधिक चांगला व सोपा आहे.
'''पद===122'''
हरि नाम तुझे अमृतसंजीवनी ।।धृ0।।
सकळ मंगलनिधि सर्वहि कार्यसिध्दि।
तरणोपाय जनीं ।।1।।
आगमनिगम संतसमागम।
वेधले देवमुनी ।।2।।
दास म्हणे करुणाघन पावन ।
तारक त्रिभुवनीं ।।3।।
'''भावार्थ==='''
हरीचे नाम हे संजीवन देणार्या अमृता सारखे असून मांगल्याचा ठेवा आहे. सर्व कार्य सिद्धीस नेण्यास समर्थ आहे. हरिनामा शिवाय अन्य तरणोपाय नाही. वेद व शास्त्र संताची संगति यांनी देवमुनींचे चित्त वेधून घेतले. संत रामदास म्हणतात, करुणाघन हरीचे नाम पावन असून त्रिभुवनांत तारक आहे.
'''पद===124'''
नाम हरीचे गोड। सखया ।।धृ0।।
घेउनि रुची त्या नामरसाची ।भवबेडी हे तोड ।।1।।
बैसुनियां गृहीं वेळ नको गमूं ।भलती बडबड सोड।। 2।।
रामदास म्हणे आवरूनि मन हें। सद्गुरुचरणा जोड।। 3।।
'''भावार्थ ==='''
हरीचें नाम अत्यंत गोड असून त्या नामरसाची गोडी लागल्यास संसार बंधनाची बेडी तुटण्यास वेळ लागणार नाही.घरांत बसून भलती बडबड करण्यांत वेळ घालवण्यापेक्षा मनाला आवर घालून मन सद्गुरु चरणांसी स्थिर करावें असे संत रामदास आपल्या शिष्यांना उपदेश करतात.
'''पद===125'''
आठवला श्रीराम। हृदयीं ।।धृ0।।
आठव नाठव शोधुनि पाहतां। मन जालें विश्राम।। 1।।
फळलें भाग्य बहुजन्मांचें। नामीं जडलें प्रेम ।।2।।
रामाविण अनु न दिसें कांहीं। दासाचा हा नेम ।।3।।
'''भावार्थ ==='''
पुष्कळ दिवसांचे भाग्य फळाला आले आणि अंतरांत श्रीराम प्रकट झाला. नामावर प्रेम जडले, रामाशिवाय दुसरे कांही दिसेनासे झाले.श्रीरामाची आठवण कधी झाली आणि विसर केव्हां पडला हे शोधून पाहतांना मन रामचरणीं विश्राम पावले.
'''पद===126'''
श्रीगुरूंचे चरणपंकज हृदयीं स्मरावें ।।धृ0।।
निगमनिखिल साधारण। सुलभाहुनि सुलभ बहू।
इतर योग याग विषमपथीं कां शिरावे ।।1।।
नरतनु दृढ नावेसी। बुडवुनि अति मूढपणें।
दुष्ट नष्ट सुकर कुकर तनूं कां फिरावें ।।2।।
रामदास विनवि तुज। अझुनि तरी समज उमज।
विषयवीष सेवुनियां फुकट कां मरावें। ।।3।।
'''भावार्थ ==='''
श्रीगुरूंच्या चरणांचे अंतःकरणात स्मरण करावें, साधारणपणे वेदांतात सांगितलेलें हे सर्वांत सुलभ साधन आहे. योग याग हे अवघड मार्ग आहेत, या मार्गिने जाऊ नये. सर्वश्रेष्ठ अशी नरदेह रुपी नौका
लाभली असतांना मूर्खपणे तिला बुडवून ,परमेश्वर प्राप्तीची संधी वाया घालवू नये. संत रामदास साधकांना विनंती करतात कीं इंद्रियसुखाचे विषय विषासारखे आहे त्यांच्या मागे लागून आयुष्य फुकट घालवू नये हे समजून घ्यावे.
'''पद===127'''
गुरुचरणीं मना लीन होई रे ।।धृ0।।
त्याविण आणीक कोण करी अनन्य।
मानधनांसी न ध्याई रे ।।1।।
हा भवसागर दुस्तर जाणुनी।
नामामृत तूं घेई रे ।।2।।
दास उदास आस गुरूची।
कांस धरूनी पदीं राही रे ।।3।।
'''भावार्थ ==='''
साधकांना उपदेश करतांना संत रामदास या पदांत म्हणतात,मनाने गुरुचरणांशी लीन व्हावे, लोकेषणा वित्तेषणा यांचा त्याग करावा. हा भवसागर पार करणे अवघड आहे हे जाणून रामनामाचे अमृत
सेवन करावे. उदासीन वृत्तीने गुरुचरणांचा आसरा धरावा. त्या शिवाय दुसरा तरणोपाय नाही.
'''पद===128'''
समर्थ पाय सेवितां बहु सुखावलों ।।धृ0।।
तत्वमसिवाक्यशोध । करितां मीपणा रोध।
सघन आत्मरूप पावलों ।।1।।
जन्ममरण हर्षशौक। टाकुनियां सुखदु:ख ।
बोधबळें बहु उकावलों ।।2।।
जनीं वनीं रामराव। समूळ दासपणा वाव।
करूनियां ऐक्य पावलों ।।3।।
'''भावार्थ ==='''
समर्थ श्रीरामाचे चरणसेवेत अपार सुख मिळाले. आत्मरूपाचा साक्षात्कार झाला. तोच मी आहे ( सो हम) या बोध वाक्याचा शोध घेताना मीपणाचा लोप होवून परमेश्वरी तत्वाशी एकरूप झालो. सुख दु:ख, हर्ष शोक,जन्म मरण या कल्पनांपासून मुक्त झालो,अत्यंत उत्साहित झालो. जनीवनीं केवळ रामरुप दिसू लागले.श्रीराम आणि रामदास यातिल अलगता लोप पावून ऐक्य पावलो.
'''पद===129'''
नवमि करा नवमि करा।
नवमि करा भक्ति नवमी करा ।।धृ0।।
अष्टमीपरी नवमी बरी।
तये दुसरी न पवे सरी ।।1।।
राम प्रगटे भेद हा तुटे
अभेद उमटे तेचि नवमी ।।2।।
शीघ्र नवमी येतसे उर्मी
रामदास मी अर्पिली रामीं ।।3।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास रामनवमी साजरी करा असे सांगत आहेत. कृष्णाष्टमी पेक्षां नवमी अधिक चांगली असून तिची सर दुसऱ्या कोणत्याही पवित्र तिथीला येणार नाही.नवमीला श्री राम या भूतलावर अवतीर्ण झाले. प्रत्यक्ष परमेश्वर मानव रूपाने प्रगट झाल्यानें भक्त आणि भगवान हा भेदच नाहीसा झाला. अभेदपणे राम आणि रामदास एकरूप झाले.
'''पद===130'''
आनंदरूप राहों। मुदितवदन पाहों ।। धृ0।।
सम विषम दु:ख संसारिक । चेंही सकळिक साहों।। 1।।
दास हरिजन आत्मनिवेदन। अभेद भजन लाहों ।।2।।
'''भावार्थ ==='''
सर्व भक्तांनी आनंदाने प्रसन्नवदन श्रीरामाचे दर्शन घ्यावे. संसारातील बरे वाईट अनुभव संसारिक दु:ख सोसून रामदास व हरिजन यांनी भेदाभेद विसरून भगवंताला शरणागत होऊन भजन करावें. असे संत रामदास या पदांत सुचवतात.
'''पद ===131'''
जेणे ध्यावें तें ध्यानाचा जालें।
मीपण तूंपण निवडोनो गेले ।।धृ0।।
भवभयें आकळलेंसे कळलें।
अंतर तें निवळले वळलें ।।1।।
विघ्न अनावर अवचट टळलें ।
दास म्हणे हें सुकृत फळलें ।।2।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास एका पारमार्थिक अनुभवाचे वर्णन करतात. ध्यानाला बसलेला साधक, ध्यानाची क्रिया आणि ज्याचे ध्यान लावले तो परमेश्वर एकरूप ह्मेऊन साधक, साधना व साध्य ही त्रिपुटी लयास जाऊन भक्त व भगवान याच्या मधील मी तूं पणा नाहिसा होतो.भवभयाची बाधा लोप पावून अंतर शुध्द होते. अनावर असे भयंकर विघ्न टळतें. साधकाचे पूर्व पुण्य फळाला येते.
'''पद ===132'''
हरी अनंत लीळा ।अभिनव कोण कळा ।।धृ0।।
खेचर भूचर सकळ चराचर। हेत बरा निवळा।। 1।।
दास म्हणे तो अंतरवासी। सकळ कळा विकळा।। 2।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास म्हणतात, हरि अनंत रुपानें सर्व चराचराला अंतर्बाह्य व्यापून राहिला आहे.आकाशांत पृथ्वीवर वास करणार्या सर्व सजीव सृष्टीत विविध रुपें घेऊन तो अभिनव लीळा करतो.
'''पद===133'''
सकळ कळलें कळलें। भाग्य सकळ फळलें।। धृ0।।
नेमक बोलणें नेमक चालणें। नेमक प्रत्यय आला।। 1।।
समजलें तें बोलतां न ये। बोलतां अनंत ये ना।। 2।।
दास म्हणे मौन्ये अंतर जाणा। नि:शब्द अंतरखुणा।। 3।।
'''भावार्थ ==='''
यथार्थ गोष्टीचा अनुभव आल्यानंतर तो नेमक्या शब्दांत व्यक्त करणे आणि त्यां प्रमाणे आचरण करणे ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.त्यामुळे भाग्य उदयास येते. अंत:करणाला जे समजतें ते सर्वच
बोलून दाखवतां येत नाही अशा वेळीं मौन बाळगणें चांगले. संत रामदास म्हणतात, नि:शब्द भावना मूकपणे अंतरखुणेने जाणून घेण्याची कला शिकणें म्हणजेच सकळ भाग्य फळाला येणे.
'''पद ===134'''
अरे कर सारविचार कसा ।।धृ0।।
क्षीर नीर एक हंस निवडिती।काय कळे वायसां।। 1।।
माया ब्रह्म एक संत जाणती। सारांश घेती तसा।। 2।।
दास म्हणे वंद्य निंद्य वेगळें। कर्मानुसार ठसा ।।3।।
'''भावार्थ==='''
संत रामदास या पदांत सारासार विचार करावा असे सांगतात.दूध आणि पाणी वेगळ करण्याचे कौशल्य (नीर क्षीर विवेक) फक्त राजहंस जाणतो. कावळ्या सारख्या सामान्य पक्षी तें करु शकत नाही. तसेच माया आणि ब्रह्म ही तत्वें फक्त संत जनच जाणतात. वंदनीय व निंदनीय हे जाणण्याची कला प्रत्येकाला कर्मानुसार अवगत करता येते.
'''पद ===135'''
सुटत नाहीं सुटत नाहीं सुटत नाहीं माया ।।धृ0।।
पाहों जातां सत्य असेना मानस घेतें धाया।
दिसतसे परी सत्य न राहे पंचभूतिक काया ।।1।।
होइल तें मग जाइल शेवट खटपट व्यर्थचि वायां ।
रामदास म्हणे सत्य निरंजन विरहित मायिक माया।। 2।।
'''भावार्थ ==='''
ब्रह्म सत्य ( चिरकाल टिकणारे) असून माया असत्य (क्षणभंगुर) आहे. वरवर पाहतां ती खरी भासते मन मायाजालात गुंतून पडते. मानवी देह पंचभूतांचा बनलेला आहे, जे आज अस्तित्वात आहे ते अविनाशी नाही,त्याचा शेवट ठरलेला आहे. संत रामदास म्हणतात सत्य निरंजन असून ते चिरंतन आहे.
'''पद===136'''
अरे मन पावन देव धरीं। अनहित न करीं।। धृ0।।
नित्यानित्य विवेक करावा। बहुजन उध्दरीं।। 1।।
आत्मा कोण अनात्मा कैसा। पर पार उतरीं।। 2।।
दास म्हणे तुझा तूंचि सखा रे ।हित तुझें तूं करी।। 3।।
'''भावार्थ==='''
संत रामदास या पदांत मनाला उपदेश करतात. मनाने आपले अनहित न करता पतितपावन परमात्म्याची भक्ती करावी, नित्य काय व नश्वर याचा विचार करावा. बहुजनांना सनमार्गाला लावावे. आत्मा कोण आणि अनात्मा कसा असतो हे विवेकाने ओळखून स्वता:चे हित करावे कारण आपणच आपला मित्र किंवा शत्रु असतो.
'''पद===137'''
कोण मी मज कळतचि नाहीं।
सारासार विचारुनि पाहीं ।।धृ0।।
नर म्हणों तरि नारि चि भासे।
नारि म्हणों तरि समूळ विनासे ।।1।।
स्थूळ म्हणों तरि सूक्ष्मचि भासे।
सूक्ष्म म्हणों तरि कांहीं न दिसे ।।2।।
दास म्हणों तरि रामचि आहे।
राम म्हणों तरि नाम नसाहे ।।3।।
'''भावार्थ ==='''
साधकानें प्रथम आपल्या आत्मतत्वाची ओळख करून घ्यावी असे संत रामदास या पदांत सुचवतात सार (अविनाशी) व असार(नश्वर) याचा विवेक करावा.नर आणि नारी, स्थूळ आणि सूक्ष्म, भक्त
आणि भगवान हे भेद आत्मतत्वाला लागू होत नाहीत.तेथें सर्व भेदाभेद लयास जातात.
'''पद===138'''
प्रगट निरंजन प्रगट निरंजन प्रगट निरंजन आहे।
आगम निगम संतसमागम सद्गुरूवचनें पाहें।। धृ0।।
आत्मविचारें शास्त्रविचारें गुरुविचारें बोध।
मीपण तूंपण शोधून पाहतां आपण आपणा शोध।। 1।।
जडासी चंचल चालविताहे चंचळ स्थिर न राहे।।2।।
प्रचित आहे शोधूनि पाहें निश्चळ होऊन राहें
भजनीं भजन आत्मनिवेदन श्रवण मनन साधा।
दास म्हणे निजगुज साधतां नसे भवबाधा।। 3।।
'''भावार्थ ==='''
निरंजन (अत्यंत निर्मळ) असे आत्मतत्त्व सर्व सृष्टीत सदोदित स्पष्टपणे दिसून येणारें(प्रगट) अवस्थेत आहे. सर्व वेद, शास्त्र, संतसाहित्य सद्गुरूंची वचने याची साक्ष देतात. आपण जेव्हां आपला शोध घेऊ लागतो तेंव्हा एकच आत्मतत्व सगळीकडे भरून राहिलें मी तूपणा हा भेद दिसत नाही. जड देहाला चंचल आत्मा चैतन्य देतो, याचा अविचल राहून शोध घेतल्यास त्याचा अनुभव घेतां येतो. श्रवण, मनन, भजन, आणि आत्मनिवेदन (संपूर्ण शरणागती) हे भक्तीमार्ग आहेत, त्यांचा अवलंब केल्यास आत्मतत्वाचें रहस्य समजून येतें व भवबंधने तुटून जातात.
'''पद===139'''
हरी अनुमानेना ।देह देव घडेना ।।धृ0।।
नाना निश्चये संशयकारी ।हित घडेल घडेना।। 1।।
बहुतेक हे जन बहुचक जालें। प्रत्यय येकचि येना।। 2।।
दास म्हणे हे गचगच जाली। काशास कांहीं मिळेना।। 3।।
'''भावार्थ==='''
हरीच्या स्वरुपाचे कांही अनुमान (अंदाज) काढता येईना त्यामुळें देहाला देवपण मिळेना. नाना प्रकारचे विचार, शंका, कुशंका यामुळें पारमार्थिक हित घडेना.अनेकांची विविध मते व वाचाळता या मुळें कोणताही प्रत्ययकारी अनुभव येईना. संत रामदास म्हणतात, अस्थिर वातावरणात सर्वत्र गचगच (निष्फळ चर्चा) झाल्याने कशाचा कशालाही मेळ राहिला नाही.
'''पद===140'''
बहुरंगा रे भवभंगा। पावन देव अभंगा। ।।धृ0।।
जनपाळा गोपाळा। सुंदर नाटक लीळा ।।1।।
धन्य लीळा रे घननीळा ।भूषणमंडित कीळा।। 2।।
सर्व जाणे रे खूण बाणे। आम्ही दास पुराणे। ।।3।।
'''भावार्थ ==='''
जनांचे पालन करणारा गोपाळ कृष्ण पतितपावन देव असून तो संसाराच्या सर्व बंधना पासून मुक्ति देणारा, बहुरंगी, सुंदर लिळा करणारा नाटककार आहे. या घननिळाच्या सर्वच लीळा भूषणावह आहेत.या लिळांच्या सर्व खुणा संत रामदासां सारखे अनुभवी भक्त जाणतात.
'''पद ===141'''
सकळ घटीं जगदीश एकला।
स्मरणरूप स्मरणेचि देखिला ।।धृ0।।
शिव कळेना शक्ति कळेना।
भक्ति कळेना विभक्ति कळेना ।।2।।
चालवितो तो दिसत नाहीं।
तीक्ष्ण बुध्दी विचारुनी पाहीं ।।3।।
दास म्हणे तो चंचळ आहे।
तेणें करुनी निरंजन पाहें ।।4।।
'''भावार्थ ==='''
सर्वांच्या अंत:करणरुपी घटामध्यें तो एकटाच जनदीश व्यापून राहिला आहे, तो स्मरणरुप असून केवळ स्मरणानेच त्याचा साक्षात्कार घडतो. शिव शक्तिचे स्वरुप जाणण्यासाठी करायची भक्ती व विभक्ति कशी करावी हें समजत नाही, सर्व प्राणिमात्रांचा चालक असून तो दिसत नाही.संत रामदास म्हणतात, तीक्ष्ण बुध्दीनें विचार केल्यास असे समजते कीं, ते शिवरुप अत्यंत चंचळ असल्याने निरंजन(निर्मळ)स्वरुपाचे आहे.
'''पद===142'''
चंचळीं निश्चळ परी तें चळत नाहीं।
चंचळ ते येतें जातें अंतर शोधूनि पाहीं ।।धृ0।।
दूध आणि ताक एक करतां नये।
उमजल्यावांचुनि लोकां समजे काय ।।1।।
चंचळी राहसी तरि तूं चंचळ होसी ।
निश्चळाच्या योगें समाधान पावसी ।।2।।
दास म्हणे आम्ही भक्त विभक्त नव्हों ।
शरीरसंबंधें विषम विवेकें साहों ।।3।।
'''भावार्थ ===='''
देह हा पंचभौतिक असून तो अशाश्वत आहे, आत्मतत्व निश्चळ असून अशाश्वत देहांत राहूनही ते चळत नाहीं. अविनाशी आत्मा आणि विनाशी देह यां मधील फरक समजून घेतला पाहिजे, दूध आणि ताक भिन्न धर्मी असून ते एकत्र करतां येत नाही. देहात राहून साधक जर आपण देहच आहोत असे मानू लागला तर तो भवबंधनात अडकून पडेल, निश्चळ बनला तर भवबंधनातून मुक्त होऊन समाधान पावेल.संत रामदास म्हणतात, ते भक्त असून भगवंता पासून कधीच विभक्त (वेगळे) नसतात.
'''पद===143'''
जिणें हें दो दिसांचें। पाहतां शाश्वत कैंचे ।।धृ0।।
शरीर संपति कांहीं न राहे ।सावध होउनि पाहें।। 1।।
कितेक होते कितेक जाते। येथें कोण रहातें ।।2।।
दास म्हणे सत्कीर्ति करावी। सृष्टि सुखेचि भरावी ।। 3।।
'''भावार्थ ===='''
माणसाचे आयुष्य दोन दिवसांचे नश्वर आहे, त्याला शाश्वत म्हणतां येत नाही.शरीर आणि संपत्ती काहीच कायम टिकणारे नाही.किती लोक जन्माला येतात आणि काळाच्या मुखांत नाहिसे होतात. या साठीं चांगली कामे करून ही सृष्टी सुखाने भरावीं असे संत रामदास सुचवतात.
'''पद===144'''
देवासि जाऊनि वेडे आठवी संसारकोडें।
रडतें बापुडें दैन्यवाणें रे ।।धृ0।।
मागील आठवण करितां होतसे सीण।
दु:ख ते कठिण समागमें रे। ।।1।।
त्यागूनि निरूपण हरिकथाश्रवण।
लागलें भांडण एकमेकां रें। ।।2।।
रामीरामदास म्हणे कपाळ जयाचें उणें।
देवासि जाऊन दु:ख दुणें रे ।।3।।
'''भावार्थ==='''
कांहीजण देवदर्शनाला मंदिरात जातात मनोभावे देवाची प्रार्थना करण्याऐवजी संसारातील समस्या आठवतात,दीनवाणे होऊन रडतात. मागील आठवणी मनाला यातना देतात. हरिकथाश्रवण करून निरूपण ऐकण्याचे सोडून एकमेकांशी भांडण करतात. संत रामदास म्हणतात, जे कमनशिबी असतात त्यांचे दु:ख देवाकडे जाऊन दुणावतें.
'''पद===145'''
भक्ति नको भक्ति नको विषयांची ।।धृ0।।
विषयें वाटतसें सुख। परि तें दु:खमूळ ।।1।।
विषय सेवितां गोड ।शेवटीं जड परिणामीं ।।2।।
रामदास म्हणे मनीं। विषयें जनीं अधोगती ।।3।।
'''भावार्थ ==='''
या पदांत संत रामदास सांगतात कीं, इंद्रिय विषयांची आसक्ती धरु नये, त्यामुळे आपली अधोगती होते. विषय भोगतांना सुख वाटतें परंतू ते दु:खाचे मूळ आहे. विषयांचे सेवन केल्याने गोड वाटते परंतू परिणामी ते सहन करण्यास कठिण असते.
'''पद ===146'''
घटिका गेली पळें गेली तास वाजे झणाणा।
आयुष्याचा नाश होतो राम कां रें म्हणाना।। धृ0।।
एकप्रहर दोन प्रहर तीन प्रहर गेले।
चौथा प्रहर संसारांत चावटीनें नेले ।।1।।
रात्र कांहीं झोप कांहीं स्रीसंगें गेली।
ऐसी आठाप्रहरांची वासलात जाली ।।2।।
दास म्हणे तास बरा स्मरण सकळां देतो।
क्षणोक्षणीं राम म्हणा म्हणुनि झणकारितो।। 3।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास म्हणतात, घटिका मागून घटिका, तासा मागून तास व दिवसा मागून दिवस सरतात शेवटीं आयुष्य संपून जातें आणि रामस्मरण करायचे राहून जाते. दिवसाचे चार प्रहर संपून रात्र होते. रात्रीचा कांहीं काळ स्रीसंगात संपतो व बाकी झोपेंत निघून जातो, अशा प्रकारे आठ प्रहरांची वासलात लागते. दिवसाचा प्रत्येक तास ठोके देऊन सर्वांना रामानामाचे स्मरण करुन देतो.
'''पद===147'''
ज्या ज्या वेळीं जें जें होईल तें तें भोगावें।
विवेकाला विसरुनि आपण कष्टी कां व्हावें।। धृ0।।
एकदां एक वेळ प्राण्यां बहु सुखाची गेली।
एकदां एक वेळ जीवां बहु पीडा जाली ।।1।।
एकदां मागूं जातां मिळतीं षड्रस पक्वानें।
एकदां मागूं जातां न मिळे भाजीचें पान। ।।2।।
संपत्ति विपत्ति दोन्ही पूर्वदत्ताचें फळ।
ऐसें प्राणी जाणेना तो मूर्खचि केवळ ।।3।।
सुखद:ख सर्वहि आपुल्या प्रारब्धाधीन।
उगेंचि रुसावें भलत्यावरिं तें मूर्खपण। ।।4।।
मातापिता वनिता यांनी उगेंचि पाहावें।
बरें वाईट कर्म ज्याचें त्यानेंच भोगावें ।।5।।
देहें सुखदु:खमूळ ऐसें बरवें जाणोन ।
सुखदु:खविरहित रामदास आपण ।।6।।
'''भावार्थ ===='''
आयुष्यातील काहीं काळ सुखाचा तर कांहीं दु:खाचा जातो, एक वेळ देहाला पीडा आणि मनाला यातना होतात. एकदां षड्रस(सहा रस असलेलें सुग्रास) भोजन अनायासें प्राप्त होते तर कधीं भाजीचें एक पानदेखील मागूनहीं मिळत नाही. संपत्ति ,विपत्ति (दारिद्रय)हें पूर्वकर्माचे फळ असून सुखदु:ख पूर्व सुकृतानें प्राप्त होते. ज्या वेळीं जे होईल ते भोगावें लागतें अशा वेओळीं विवेक विसरून कष्टी होऊ नये. चांगले वाईट कर्म ज्याचे त्यालाच भोगावें लागते. इतरांवर रुसणे हा केवळ मूर्खपणा आहे, आई, वडील, पत्नी यां पैकीं कुणीही आपल्या दु:खाचे सोबती नसतात.आपला देह हेच सुखदु:खाचे मूळ आहे हे जाणून आपण विवेकानें विरक्त होऊ शकतो असे संत रामदास म्हणतात.
'''पद ===149'''
अरे नर सारविचार करीं। मन बरें विवरीं ।। धृ0।।
सारासारविचार न होतां। वाहासी भवपुरीं ।।1।।
सकळ चराचर कोठुनि जालें। कोठें निमालें तरी।। 2।।
दास म्हणे जरि समजसि अंतरीं मुळीची सोय धरीं।। 3।।
'''भावार्थ ==='''
माणसानें चांगल्या वाईटाचा सारासार विचार न केल्यास संसारसागरांत प्रवाहपतिता प्रमाणे वाहून जातो. सकळ चराचर ज्या आत्मतत्वातून उत्पन्न होतें व लयास जाते हे समजून घेतले तर आत्मबोध होईल असे संत रामदास म्हणतात.
'''पद===150'''
जाणत्याचा संग धरा। हित आपुले करा।
न्यायनीति प्रचितीनें। निरूपणें विवरा ।।धृ0।।
आत्महित करीना जो। तरी तो आत्मघातकी।
पुण्यमार्ग आचरेना। तरी तो पूर्णपातकी ।।1।।
आपली वर्तणुक। मन आपुलें जाणे।
पेरिलें उगवतें। लोक जाणती शाहाणे ।।2।।
सुखदु:ख सर्व चिंता। आपुली आपण करावी ।
दास म्हणे करूनिया। वाट सुखाची धरावी ।।3।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास या पदांत साधकांनी कसे वागावें या साठी कांही सूचना देत आहेत. स्वहित साधण्यासाठीं जाणत्या लोकांच्या संगतीत राहावें,न्यायनीतीनें वागावे, रामकथांचे निरूपण करावें, प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व आत्महित साधावें नाहीतर तो आत्मघातकी ठरतो.पुण्यमार्गाचे आचरण न केल्यास पूर्णघातकी समजावा. आपले विचार व वर्तन समजून घ्यावे. आपल्या सुखदु:खाची आपणच चिंता करावी, सुखकारक मार्गाने वाटचाल करावी. आपण जे पेरतो तेच उगवतें हे समजून घ्यावे.
'''पद===151'''
सज्जन संत मुनीजन योगी।
मानिसी तरि जाणीव सांडीं ।।1।।
षड्रिपुकुळभव भ्यासुर थापा।
हाणसी तरि जाणीव सांडी ।।2।।
दास म्हणे गुण निर्गुण ते खूण।
बाणसी तरि जाणीव सांडीं ।।3।।
'''भावार्थ ===='''
संत सज्जन, मुनीजन व योगी यांना मानतो पण त्यांची जाणीव होत नाही.काम,क्रोध,मद,मत्सर,मोह,दंभ या भयंकर शत्रूंनी व्यापलेल्या भवसागराची भिती वाटत असूनही त्याची जाणीव ठेवत नाही. संत रामदास म्हणतात, सगुण भक्तीने निर्गणाकडे कसे जावे याच्या खुणा माहिती असूनही त्याची जाणीव राहात नाही.
'''पद===152'''
चाल रे मना भेटों जाऊं। सज्जना ।
तेथें आहे आमुचा रामराणा ।।धृ0।।
ऊठ लवकरीं चाल जाऊं झडकरी ।
जाऊन रामपायीं सुख घेऊं धणीवरी ।।1।।
भाव दाविला तोहि असे गोंविला ।
सोडीं काम जावो राम पाही आपुला ।।2।।
मन चालिलें तेणें मूळ शोधिलें ।
संत रामदास त्याला सकळ भेटले ।।3।।
'''भावार्थ ==='''
संत रामदास या पदांत आपल्या मनाला संत सज्जनांच्या भेटींस जाऊं असे सुचवित आहे, कारण रामराणा नेहमी सज्जनांच्या सहवासांत रमतो. तेथें जाऊन पोटभर राम दर्शनाचे सुख घेतां येईल ,जो भक्तिभावाने रामचरणीं लीन होतो तो तेथेच अडकून पडतो. सर्व कामना सोडून निष्काम मनाने रामाला शरण गेले कीं, आत्मबोध होतो व सकळ साध्य होतें असे संत रामदास
म्हणतात.
'''पद===153'''
जो जो जो जो रे श्रीराम।
निजसुख गुणविश्रामा। बाळा ।।धृ0।।
ध्याती मुनि योगी तुजलागीं । कौसल्या ओसंगीं ।।1।।
वेदशास्त्रांची मती जाण । स्वरूपी जाली लीन। ।।2।।
चारी मुक्तींचा विचार ।चरणीं पहाती थोर। ।।3।।
भोळा शंकर निशिदिनीं ।तुजला जपतो ध्यानीं ।।4।।
दास गातसे पाळणा ।रामा लक्षूमणा ।।5।।
'''भावार्थ ===='''
राम लक्ष्मणा साठी संत रामदास पाळणा गात आहेत. श्रीराम हे निजसुखाचे आगर असून सर्व गुणांचे आश्रयस्थान आहेत. कौसल्या मातेच्या मांडीवर निद्रासुख घेणाऱ्या रामरुपाचें मुनिजन व योगीजन ध्यान करतात. वेदशास्त्राची मती (बुध्दी) रामस्वरुपी लीन झाली असून चारी मुक्ती राम चरणाशीं खिळून राहिल्या आहेत. शिवशंकर रात्रंदिवस ध्यान लावून रामनामाचा जप करतात.
'''पद ===154'''
न्हाणी न्हाणी रामाते अरुंधती।
ऋषीपल्या पाहूनि संतोषती ।
रामलीला सर्वत्र मुनी गाती ।
स्नाना उदक यमुना सरस्वती। ।।1।।
ज्याच्या चरणी कावेरी कृष्णा वेणी।
ज्याच्या स्नेहें कपिलादि ऋषीमुनी।
त्या रामातें न्हाणिलें । प्रीती करुनी। ।।2।।
ज्याच्या नामें उपदेश विश्वजनां
ज्याच्या स्मरणें काळादि करिती करुणा
ज्याच्या प्राप्तीस्तव करिती अनुष्ठाना।
त्या रामातें न्हाणुनी फुंकी कर्णा ।।3।।
रमती योगी स्वरूपीं आत्माराम ।
निशिदिनीं चरणीं असावा नित्यनेम ।
त्या रामाचा पालख विश्वधाम ।
दास म्हणे भक्तीचें देई प्रेम ।।4।।
'''भावार्थ ==='''
अरुंधती बालक रामाला न्हाउं घालीत आहे त्याचे कल्पनारम्य वर्णन संत रामदास या पदांत करतात. ऋषिमुनी या रामलीला पाहून अत्यंत आनंदित होतात व गीत गातात.स्नानासाठीं यमुना सरस्वती यांचे पवित्र जल तसेच कावेरी, कृष्णा, वेण्णा यांचे जल आणले आहे कपिलमुनीं सारखे तपस्वी ज्या रामचंद्रावर अत्यंत स्नेह करतात अशा रामाला अरुंधती अत्यंत प्रमाने न्हाणित आहे. ज्याच्या नामानें सर्व विश्वजनांना उपदेश केला जातो, ज्याच्या केवळ स्मरणाने प्रत्यक्ष काळ सुध्दा करुणा करतो, ज्याच्या कृपेसाठीं अनेक अनुष्ठाने केली जातात ,ज्या आत्माराम स्वरुपांत योगीजन रममाण होतात, अनेक भक्तजन ज्या रामचरणांचा रात्रंदिवस आश्रय घेतात, संपूर्ण विश्व ज्या श्रीरामाचा पाळणा आहे त्या बालक रामाला न्हाऊ घालून कान फुंकण्याचे भाग्य अरुंधतीला लाभलें आहे. हे भक्तीप्रेम आपल्याला लाभावें अशी प्रार्थना संत रामदास करीत आहेत.
'''पद ===155'''
भूपाळी श्रीरामाची
राम सर्वांगें सावळा । हेमअलंकारें पिवळा ।
नाना रत्नांचिया किळा । अलंकारीं फांकती ।।धृ0।।
पिंवळा मुगुट किरीटी ।पिंवळें केशर लल्लाटीं ।
पिवळ्या कुंडलांच्या दाटी ।पिंवळ्या। कंठी मालिका।। 1।।
पिंवळा कांसे पीतांबर । पिंवळ्या घंटांचा गजर ।
पिंवळ्या ब्रीदाचा तोडर । पिंवळ्या वाकी वाजती ।।2।।
पिंवळा मंडप विस्तीर्ण ।पिंवळें मध्यें सिंहासन ।
राम सीता लक्षुमण । दास गुण गातसे ।।3।।
'''भावार्थ==='''
श्रीराम सावळ्या अंगकांतीचा असून पिवळ्य रंगाचे सुवर्ण अलंकार परिधान केलें आहेत. त्यां अलंकारांत जडवलेल्या रत्नांचे तेज झळाळत आहे. मस्तकावर सोनेरी मुकुट व कपाळावर केशराचा पिवळा टिळा शोभून दिसत आहे. कानांत सुवर्णाची कुंडले व कंठात सुवर्णाची माळ घातली आहे ब्रीदाचा पिवळा तोडर,हतांत पिवळी वाकी रुणझुणत आहे. पिवळा पीतांबर परिधान करून पिवळ्या रंगाच्या भव्य मंडपात अग्रभागी ठेवलेल्या पिवळ्या सिंहासनावर विराजमान असलेल्या राम सीता लक्ष्मणाचे संत रामदास गुणगान करीत आहे.
'''पद ===156'''
उठिं उठिं बा रघुनाथा ।विनवी कौसल्या माता ।
प्रभात जालीसे समस्तां । दाखवीं आतां श्रीमुख ।।धृ0।।
कनकताटीं आरती या ।घेउनि क्षमा शांति दया।
आली जनकाची तनया । ओवाळाया तुजलागीं ।।1।।
जीव शिव दोघेजण । भरत आणि तो शत्रुघ्न ।
भाऊ आला लक्ष्मण। मन उन्मन होउनियां ।।2।।
विवेक वसिष्ठ सद्गुरू ।संत महंत मुनीश्वरू ।
करिती हरिनामें गजरु ।हर्षे निर्भर होऊनियां ।।3।।
सुमंत सात्विक प्रधान ।घेउनि नगरवासी जन ।
आला वायूचा नंदन । श्रीचरण पहावया ।।4।।
माझ्या जिवींचा जिव्हाळा ।दीनबंधु दीनदयाळा।
भक्तजनांच्या वत्सला । देई दयाळा दर्शन ।।5।।
तंव तो राजीवलोचन ।राम जगत्रयजीवन ।
स्वानंदरुप होऊन । दासां दर्शन दिधलें ।।6।।
'''भावार्थ ==='''
कौसल्या माता भूपाळी गाऊन श्रीरामाला उठवित आहे. प्रभात झाली असून सर्वांना श्रीमुखाचे दर्शन द्यावें असे सुचवित आहे. सुवर्ण तबकांत क्षमा, शांती, दया
g58m8exsmoxjro9dhb75ryg3gtl7ua0
13173
13172
2022-08-20T14:42:58Z

lkpbbiae1ntz2wenjiysvr0ux0exddo
कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका
0
3164
13185
7410
2022-08-20T14:49:42Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:कोविड-१९ साहाय्य-पुस्तिका]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
<center>
[[चित्र:SARS-CoV-2 illustration.png|इवलेसे|center]]
</center>
<font size=40>
<center>
'''कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका'''
</center>
</font>
<center>
सदस्यांच्या सहभागाने तयार केलेले [[मुखपृष्ठ|विकिबुक्समधील]] मराठी विकिपुस्तक
</center>
==प्रास्ताविक==
कोविड-१९ ह्या विषाणुजन्य आजाराच्या संसर्गासंदर्भात माहिती देण्यासाठी ही पुस्तिका तयार करत आहोत. ह्या पुस्तिकेत कोविड-१९चा संसर्ग कसा रोखता येईल ह्यासंदर्भातील माहिती तसेच कोविड-१९चा संसर्ग झालेल्या व्यक्तींसाठी कोणकोणत्या तऱ्हेेचे साहाय्य उपलब्ध आहे ह्याविषयी उपलब्ध असलेली माहिती संकलित करण्याचा हेतू आहे.
{| style="Background-color:#9fc; Border:#4b4 solid 2px; margin:auto; width:65%;"
|-
! style="Border:#4b4 1px solid;"|महत्त्वाचे संपर्क
|- style="text-align:Left;"
|
* संपूर्ण महाराष्ट्रासाठी राज्यस्तरीय कोविड-१९ नियंत्रण कक्ष क्रमांक- ०२०-२६१२७३९४<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title= Untitled|दुवा=https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Acts%20Rules/Marathi/Korona%20Notification%2014%20March%202020....pdf|प्रकाशक=महाराष्ट्र शासन}}</ref>
* बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अलगीकरण, विलगीकरण केंद्रे, कोविड रुग्णालये तसेच प्रतिबंधित क्षेत्रांची माहिती [https://stopcoronavirus.mcgm.gov.in/ कोविड १९ बृहन्मुंबई महानगरपालिका] ह्या संकेतस्थळावर मिळेल.
|}
==अनुक्रमणिका==
# [[/कोविड-१९/]]
# [[/काळजी कशी घ्यावी?/]]
# [[/महाराष्ट्रातील शासकीय साहाय्यसंस्था/]]
## [[/बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र/]]
# [[/चाचण्यांसाठी रुग्णालये/]]
# [[/कोविड-१९संदर्भातील गैरसमज/]]
==संदर्भ==
[[वर्ग:कोविड-१९ साहाय्य-पुस्तिका]]
ievop88pw3xw3ula2e9ble7udjnnfbr
कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/कोविड-१९
0
3165
13187
12669
2022-08-20T14:51:00Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
कोविड-१९ हा एक विषाणुजन्य सांसर्गिक आजार आहे. हा आजार कोरोना ह्या प्रजातीतील नव्याने आढळलेल्या विषाणूमुळे होतो. कोविड-१८ ह्या आजारात प्राधान्याने श्वसनसंस्था बाधित होते. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या ह्या आजारात अगदी सौम्य, श्वसनाशी संबंधित नसलेल्या लक्षणांपासून ते श्वसनसंस्थेचा तीव्र आजार, श्वसनेंद्रिय निकामी होणे आणि मृत्यू होणे इतपत गंभीर लक्षणेही रुग्णांमध्ये आढळतात. <ref>कोविड-१९च्या संदर्भात मुखपटाचा... पृ. १</ref>
==कोविड-१९चा संसर्ग==
कोविड-१९चा संसर्ग व्यक्तींना दोन तऱ्हेने होऊ शकतो. संसर्गित व्यक्तीच्या जवळ असताना तिच्या श्वसनसंस्थेशी संबंधित उत्सर्गातून शिंतोडे उडाल्यामुळे किंवा संसर्गित व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंशी संपर्क आल्याने. अनेकदा संसर्गित व्यक्तीमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसतात. अशा व्यक्तीच्या संपर्कात आल्यानेही ह्या आजाराची लागण होऊ शकते असे दिसून येते.<ref>कोविड-१९च्या संदर्भात मुखपटाचा... पृ. २</ref>
# '''बिंदूजन्य/ शिंतोड्यांद्वारे होणारा संसर्ग :''' उपलब्ध माहितीनुसार कोविड-१९ ह्या आजाराचा संसर्ग हा माणसांमध्ये प्राधान्याने श्वसनसंस्थेद्वारे बाहेर टाकण्यात येणाऱ्या पदार्थातील थेंबांद्वारे (शिंक, कफ इ.) होतो आणि ज्या व्यक्तीला संसर्ग होतो तिच्या शरीरातील डोळे, नाक, तोंड इ. अवयवांशी ह्या बिंदूंचा संपर्क आल्याने हा रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. ज्या व्यक्तीला संसर्ग झाला आहे अशा व्यक्तीच्या १ मीटर अंतराच्या परिघात एखादी अन्य व्यक्ती आली असता संसर्गित व्यक्तीच्या शिंक, खोकला इत्यादींचे शिंतोडे उडाल्याने अथवा अशा व्यक्तीच्या स्पर्शाद्वारे अन्य व्यक्तीला लागण होऊ शकते. <ref>कोविड-१९च्या संदर्भात मुखपटाचा... पृ. १</ref>
# '''संसर्गित वस्तूंद्वारे होणारा संसर्ग' :'' संसर्गित व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात असलेल्या वस्तूंद्वारे कोविड-१९चा संसर्ग होऊ शकतो.<ref>कोविड-१९च्या संदर्भात मुखपटाचा... पृ. २</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी|4}}
==संदर्भसूची==
* {{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = https://apps.who.int/iris/rest/bitstreams/1279750/retrieve
| शीर्षक = कोविड-१९च्या संदर्भात मुखपटाचा (मास्कचा) वापर करण्याविषयी सूचना
| भाषा = इंग्लिश
| लेखक =
| लेखकदुवा =
| आडनाव =
| पहिलेनाव =
| सहलेखक =
| संपादक =
| वर्ष =
| महिना =
| दिनांक = ०५ जून २०२०
| फॉरमॅट = पीडीएफ
| आर्काइव्हदुवा =
| आर्काइव्हदिनांक =
| कृती =
| पृष्ठे =
| प्रकाशक = जागतिक आरोग्य संघटना
| अॅक्सेसवर्ष =
| अॅक्सेसमहिनादिनांक =
| अॅक्सेसदिनांकमहिना =
| ॲक्सेसदिनांक = दि. ०६ जून २०२०
| अवतरण =
}}
==बाह्य दुवे==
* [https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019|जागतिक आरोग्य संघटनेच्या संकेतस्थळावरील कोविड-१९विषयीचा विभाग]
[[वर्ग:कोविड-१९ साहाय्य-पुस्तिका]]
8lhjpupvmv9rdj10zzizcu0dn6bqjyb
कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/चाचण्यासाठी रुग्णालये
0
3169
13175
12668
2022-08-20T14:44:30Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
==रुग्णालयांची यादी ==
{| class="wikitable sortable"
|-
! संस्थेचे नाव !! शहर !! संस्थेचा प्रकार !! चाचणीची पद्धत
|-
|Sunflower Lab & Diagnostic Center, Keshav Kunj, Marve Road, Malad West||Mumbai||खाजगी संस्था ||CB NAAT
|-
|Dr. Jariwala Lab & Diagnostics LLP, 1st Floor, Rasraj Heights, Rokadia Lane, Off Mandpeshwar Road, Borivli (W)||Mumbai||खाजगी संस्था ||CB NAAT
|-
|Aditya Birla Memorial Hospital –Laboratory, Aditya Birla Marg, Chinchwad||Pune||खाजगी संस्था ||CB NAAT
|-
|Govt. Medical College||Baramati||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|Govt. Medical College||Chandrapur||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|Lokmanya Tilak Municipal General Hospital and Medical College||Mumbai||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|Intermediate Reference Laboratory||Pune||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|Govt. Medical College||Yavatmal||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|D. Y. Patil Medical College||Kolhapur||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Apoorva Diagnostic and Health Care, Bhaktivedanta Hospital and Research Institute, Bhaktivedanta Swami MArg, Sector 1, Mira Bhayandar||Mira Bhayandar||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Metropolis Healthcare Ltd, Unit No. 409-416, 4th Floor, Commercial Building-1, Kohinoor Mall ||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|SRL Limited, Prime Square Building, Plot No 1, Gaiwadi Industrial Estate, SV Road, Goregaon||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Kokilaben Dhirubhai Ambani Hospital Laboratory, Four Bungalows||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|iGenetic Diagnostics Pvt Ltd, Krislon House, Andheri East||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|SRL Diagnostics – Dr. Avinash Phadke (SRL Diagnostics Pvt Ltd), Mahalaxmi||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Engineering Estate, 2 nd Floor, L.J. Cross Road No 1, KJ Khilnani High School, Mahim (West)||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Department of Laboratory Medicine – P.D. Hinduja National Hospital and Medical Research Centre, Veer Savarkar Marg, Mahim||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Dept of Lab Medicine, Dr. Balabhai Nanavati Hospital, Swami Vivekananda Road||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Dhruv Pathology and Molecular Diagnostic Lab, Third Floor, Aditya Enclave, Centra Bazaar Road, Ramdaspeth||Nagpur||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Daignostic Molecular Laboratory, Dept of Microbiology, Dr. Vasantrao Pawar Medical College Hospital & Research Centre, Vasantdada Nagar, Adgaon||Nashik||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Datar Cancer Genetics Ltd, F-8, D-Road, Ambad MIDC||Nashik||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Thyrocare Technologies Limited, D37/1, TTC MIDC, Turbhe||Navi Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Sir H.N. Reliance Foundation Hospital and Research Centre, Molecular Medicine, Reliance Life Sciences Pvt. Ltd., R-282, TTC Industrial Area, Rabale||Navi Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|MGM Medical College and Hospital||Navi Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|A.G. Diagnostics Pvt Ltd, Nayantara Building||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Sahyadri Speciality Labs, Plot No 54, S.No. 89-90, Lokmanya Colony, Kothrud||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Metropolis Healthcare Limited, Construction House, 796/189-B, Bhandarkar Institute Road||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
| Genepath Diagnostics India Pvt Ltd, 4 th Floor, Above Phadke Hospital||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Krsnaa Diagnostics Pvt Ltd, Lt. Jayabai Nanasaheb Sutar Maternity Home||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Lab Services, Ayugen Biosciences Pvt Ltd, 562/1, Shivajinagar||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|#Ruby Hall Clinic, Dept of Laboratory, Grant Medical Foundation, 40, Sassoon Road||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Molecular Diagnostic Laboratory, Department of Pathology, LMMF's Deenanath Mangeshkar Hospital and Research Center, Erandwane, ||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Dr. DY Patil Medical College Hospital and Research Centre, Pimpri||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Dept of Molecular Biology & Genetics, Krishna Institute of Medical Sciences, Karad||Satara||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Vaidya Lab Thane, Unit of Millenium Special Lab Pvt Ltd, Odyssey Park, 2 nd Floor, 201, Raghunath Nagar, Wagle Estate||Thane||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Metropolis Healthcare Limited, Shop No.1, Ground Floor, Ahilya Building, Savarkar Marg, Thane West||Thane||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|InfeXn Laboratories Private Limited, A/131, Therelek Compound, Road No 23, Wagle Industrial Estate||Thane (W)||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|District General Hospital||Ahmednagar||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Akola||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Sant Gadge Baba Amravati University||Amravati||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Aurangabad||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Government Medical College ||Baramati||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Shree Bhausaheb Hire Govt. Medical College||Dhule||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Jalgaon||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|#RCSM Govt. Medical College||Kolhapur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Vilasrao Deshmukh Govt. Institute of Medical Sciences||Latur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Miraj||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Seth GS Medical College & KEM Hospital||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Kasturba Hospital for Infectious Diseases||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|National Institute of Virology Field Unit||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Grant Medical College & Sir JJ Hospital||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Haffkine Institute||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|National Institute for Research on Reproductive Health||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|INHS Ashvini||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*Tata Memorial Centre ACTREC||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*Tata Memorial Hospital||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Indira Gandhi Govt. Medical College||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|All India Institute of Medical Sciences||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Nagpur Veterinary College, MAFSU||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|#Intermediate Reference Laboratory||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*National Environmental Engineering Research Institute||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Swami Ramanand Teerth Marathwada University||Nanded||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Model Rural Health Research Unit (MRHRU), Sub District Hospital, Agar, Dahanu ||Palghar||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|ICMR-National Institute of Virology||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Armed Forces Medical College||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|BJ Medical College||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Command Hospital (SC)||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|ICMR-National AIDS Research Institute||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*National Centre for Cell Sciences||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*Indian Institute of Science Education and Research (IISER)||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|V. M. Govt. Medical College||Solapur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Mahatma Gandhi Institute of Medical Sciences, Sevagram||Wardha||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Rajiv Gandhi Medical College & CSM Hospital, Kalwa, Thane, Mumbai||||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Rural Medical College, Pravara Institute of Medical Sciences, Loni||Ahmednagar||खाजगी संस्था ||TrueNat
|-
|Qualilife Diagnostics, Balaji Arcade, 1st Floor, 544/A, Netaji Subhash Road, Mulund (W)||Mumbai||खाजगी संस्था ||TrueNat
|-
|Civil Surgeon, District Hospital||Parbhani||शासकीय संस्था ||TrueNat
|}
[[वर्ग:कोविड-१९ साहाय्य-पुस्तिका]]
[[वर्ग:कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका]]
ao4rnl18ycr787yuu301h44r6zqtrrx
13189

gbejeusxptd9pr50rkfqmwu9mqm7bfx
कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/काळजी कशी घ्यावी?
0
3171
13191
12670
2022-08-20T14:51:01Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
==सर्वसाधारण सूचना==
# दररोज आपले हात अल्कोहोल असलेल्या सॅनिटायझरने किंवा साबणाने धुवा.
# स्वत: आणि इतरांमध्ये कमीतकमी १ मीटर (३ फूट) अंतर ठेवा.
# गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळा.
# डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा
# मुखपटाचा (मास्कचा) वापर करा. खोकला व शिंक आल्यास हातरुमालाचा किंवा टिश्यू पेपरचा वापर करा व नंतर त्याची योग्य विल्हेवाट लावा.
==मुखपटाचा वापर ==
कोविड-१९चा प्रसार रोखण्यासाठी मुखपटाचा वापर करावा अशा सूचना विविध माध्यमांतून देण्यात येत आहेत. त्याबाबतचे काही मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहे.
===== मुखपटाचे (मास्कचे) प्रकार =====
* वैद्यकीय मुखपट
एखाद्या आरोग्य सेवा यंत्रणेतील संसर्ग-जोखमीची पातळी किंवा त्या यंत्रणेची कार्यपद्धती ह्यांना अनुलक्षून योग्य उत्पादनाचा वापर केला जावा म्हणून आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय मानकांनुसार प्रमाणित असलेले वैद्यकीय मुखपटच वापरले जावेत.
वैद्यकीय मुखपट हे एका वापरापुरते असतात.
सामान्य लोकांमध्ये हे वैद्यकीय मुखपट वापरण्यात आले तर त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना किंवा ज्या व्यक्तींना ह्याप्रकारच्या मुखपटांची जास्त गरज आहे अशांना त्यांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. ज्या यंत्रणांमध्ये मुखपटांचा तुटवडा आहे, तिथे वैद्यकीय मुखपट हे केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी किंवा जिवाला धोका असलेल्या व्यक्तींसाठी राखून ठेवावेत.
* वैद्यकीयेतर मुखपट
वैद्यकीयेतर मुखपट म्हणजेच विणीचे मुखपट हे विविध प्रकारच्या कापडांनी तयार केलेले तसेच बिनविणीचे म्हणजेच पॉलिप्रॉपायलीनने (polypropylene) तयार केलेलेही असतात. अनेक प्रकारची कापडे जोडून हे मुखपट बनवले जाऊ शकतात आणि ते विविध आकारांत उपलब्ध असतात. कापडांतील पदर हे मर्यादित असावेत जेणेकरून त्यामुळे श्वसनाला बाधा येणार नाही.
वैद्यकीयेतर मुखपट हे समाजातील संसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने संसर्गबाधित व्यक्तींनी वापरायचे आहेत. त्यामुळे संसर्ग प्रतिबंध होतो असे मानू नये. सार्वजनिक वाहतुकीतून प्रवास करताना शारीरिक अंतर पथ्याचे पालन करणे शक्य नसते. अशावेळी तात्पुरती खबरदारी म्हणून अशा प्रकारचे मुखपट वापरावेत. मात्र वापर करतेवेळी नेहमी स्वच्छता राखणेही गरजेचे आहे.
* अवैद्यकीय मुखपटांच्या निर्मितीवेळी पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत -
१. वापरण्यात येणाऱ्या सामग्रीचा प्रकार - त्यांच्या पदरांची गालनक्षमता, श्वसनक्षमता
मुखपटांच्या निर्मितीत योग्य सामग्रीची निवड करणे ही एक महत्त्वाची पायरी आहे. वापरात आलेल्या कापडावर मुखपटाची गालनक्षमता तसेच श्वसनक्षमता अवलंबून असते. विणीच्या मुखपटांमध्ये वापरण्यात आलेले कापड, धागे इत्यादींची विण कितपत घट्ट आहे ह्यावरून त्यांची गालनक्षमता ठरवली जाते. तर बिगरविणीच्या मुखपटांमध्ये गालनक्षमता ही त्यांच्या निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून असते.
मुखपटाची सामग्री श्वसनक्षम असावी. त्यातून श्वासोच्छ्वास करण्यास अडथळा येता कामा नये. मुखपटासाठी वापरात येणाऱ्या कापडात गालनक्षमता आणि श्वसनक्षमता दोन्हींचा समतोल राखणे महत्त्वाचे आहे.
मुखपटांच्या निर्मितीसाठी शक्यतो लवचिक सामग्री वापरू नये. असे केल्यास वापर करताना मुखपटाची सामग्री चेहऱ्यावर ताणली जाईल आणि त्यामुळे श्वसनाला बाधा येऊ शकते.
२. मुखपटातील पदरांची संख्या
नायलॉन किंवा पॉलिस्टरच्या कापडाचे दोन वा जास्तीत जास्त चार पदरी मुखपट वापरल्याने त्यांची गालनक्षमता वाढते. सुती रुमालाच्या मुखपटात किमान चार पदर तरी असावेत. सच्छिद्र कापडांचा वापर टाळावेत, त्यांची गालनक्षमता फारच कमी असते. मात्र, घट्ट विणीच्या मुखपटांमध्ये पदरांची संख्या वाढवल्यास त्यांच्या श्वसनक्षमतेत घट होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या निर्मितीनंतर लगेचच त्यांची श्वसनक्षमता तपासण्यासाठी नाकावाटे व तोंडावाटे श्वसनाचे प्रयोग करून पडताळणी करून घ्यावी.
३. मुखपटासाठी वापरण्यात येणाऱ्या सामग्रीतील मिश्रणे
वैद्यकीयेतर मुखपटाच्या सामग्रीत पुढीलप्रमाणे तीन पदरांचे मिश्रण असावे -
अ) सर्वात आतील पदर हा जलग्राही म्हणजेच सुती कापडाचा असावा
ब) सर्वात बाहेरील पदर हा जलापकर्षि म्हणजेच पॉलिप्रॉपायलीन, पॉलिस्टर किंवा त्यांच्या मिश्रणाचा असावा, ज्यामुळे बाहेरील संसर्गाचा वापरकर्त्याच्या नाकातोंडाशी थेट संपर्क येणार नाही
क) मधला पदर हा पॉलिप्रॉपायलीनसारख्या कृत्रिम धाग्यांच्या (संश्लेषित) कापडाचा किंवा सुती कापडाचा असावा ज्यामुळे गालनक्षमता वाढते.
४. मुखपटाचा आकार
मुखपट हे साधारणतः पसरट वा चोचीच्या आकाराचे असतात. वापरकर्त्याचे नाक, गाल व हनुवटी एवढा भाग व्यापण्याच्या उद्देशाने त्यांची निर्मिती केली जाते. जर मुखपटाच्या कडा चेहऱ्याच्या जवळ नसतील तर बोलताना आतील वा बाहेरील हवा त्या कडांमधून सहजपणे आत-बाहेर जाऊ-येऊ शकते. तेव्हा, मुखपटांच्या निर्मितीवेळी ही बाबदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे.
५. कापडावरील आवरण
कापडावर मेण किंवा तत्सम काही मिश्रणांचे आवरण असावे, ज्यामुळे हवेतील कणांच्या प्रवेशावर प्रतिबंध येईल शिवाय कापडही द्रव-प्रतिरोधक होईल. पण अशा आवरणांमुळे नकळत कापडावरील छिद्रे बुजू शकतात व मुखपटाद्वारा श्वास घेण्यास बाधा येऊ शकते.
६. मुखपटाचे व्यवस्थापन
वैद्यकीयेतर मुखपट हे सतत धुऊन स्वच्छ केले पाहिजेत. इतर वस्तू त्यामुळे दुषित होऊ नयेत म्हणून त्यांची व्यवस्थित हाताळणी केली पाहिजे. कापडातील पदर विरलेले आढळल्यास ताबडतोब मुखपटाची विल्हेवाट लावावी. कापडाच्या प्रकारानुसार योग्य त्या तापमानाच्या पाण्यात त्यांचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे.
गरम पाणी उपलब्ध नसल्यास साबणाने मुखपट धुवावेत व लगेचच साध्या पाण्यात एक मिनिटभर बुडवून मग स्वच्छ करावेत ज्यामुळे त्यात साबणाचा काही अंश उरणार नाही.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==संदर्भसूची==
{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा = https://apps.who.int/iris/rest/bitstreams/1279750/retrieve
| शीर्षक = कोविड-१९च्या संदर्भात मुखपटाचा (मास्कचा) वापर करण्याविषयी सूचना
| भाषा = इंग्लिश
| लेखक =
| लेखकदुवा =
| आडनाव =
| पहिलेनाव =
| सहलेखक =
| संपादक =
| वर्ष =
| महिना =
| दिनांक = ०५ जून २०२०
| फॉरमॅट = पीडीएफ
| आर्काइव्हदुवा =
| आर्काइव्हदिनांक =
| कृती =
| पृष्ठे =
| प्रकाशक = जागतिक आरोग्य संघटना
| अॅक्सेसवर्ष =
| अॅक्सेसमहिनादिनांक =
| अॅक्सेसदिनांकमहिना =
| ॲक्सेसदिनांक = दि. ०६ जून २०२०
| अवतरण =
}}
[[वर्ग:कोविड-१९ साहाय्य-पुस्तिका]]
ch3gi5gpw7r1nyih7y64yy8kkdzq1ix
कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/चाचण्यांसाठी रुग्णालये
0
3173
13188
12667
2022-08-20T14:51:00Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
==रुग्णालयांची यादी ==
{| class="wikitable sortable"
|-
! संस्थेचे नाव !! शहर !! संस्थेचा प्रकार !! चाचणीची पद्धत
|-
|Sunflower Lab & Diagnostic Center, Keshav Kunj, Marve Road, Malad West||Mumbai||खाजगी संस्था ||CB NAAT
|-
|Dr. Jariwala Lab & Diagnostics LLP, 1st Floor, Rasraj Heights, Rokadia Lane, Off Mandpeshwar Road, Borivli (W)||Mumbai||खाजगी संस्था ||CB NAAT
|-
|Aditya Birla Memorial Hospital –Laboratory, Aditya Birla Marg, Chinchwad||Pune||खाजगी संस्था ||CB NAAT
|-
|Govt. Medical College||Baramati||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|Govt. Medical College||Chandrapur||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|Lokmanya Tilak Municipal General Hospital and Medical College||Mumbai||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|Intermediate Reference Laboratory||Pune||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|Govt. Medical College||Yavatmal||शासकीय संस्था ||CB NAAT
|-
|D. Y. Patil Medical College||Kolhapur||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Apoorva Diagnostic and Health Care, Bhaktivedanta Hospital and Research Institute, Bhaktivedanta Swami MArg, Sector 1, Mira Bhayandar||Mira Bhayandar||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Metropolis Healthcare Ltd, Unit No. 409-416, 4th Floor, Commercial Building-1, Kohinoor Mall ||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|SRL Limited, Prime Square Building, Plot No 1, Gaiwadi Industrial Estate, SV Road, Goregaon||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Kokilaben Dhirubhai Ambani Hospital Laboratory, Four Bungalows||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|iGenetic Diagnostics Pvt Ltd, Krislon House, Andheri East||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|SRL Diagnostics – Dr. Avinash Phadke (SRL Diagnostics Pvt Ltd), Mahalaxmi||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Engineering Estate, 2 nd Floor, L.J. Cross Road No 1, KJ Khilnani High School, Mahim (West)||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Department of Laboratory Medicine – P.D. Hinduja National Hospital and Medical Research Centre, Veer Savarkar Marg, Mahim||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Dept of Lab Medicine, Dr. Balabhai Nanavati Hospital, Swami Vivekananda Road||Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Dhruv Pathology and Molecular Diagnostic Lab, Third Floor, Aditya Enclave, Centra Bazaar Road, Ramdaspeth||Nagpur||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Daignostic Molecular Laboratory, Dept of Microbiology, Dr. Vasantrao Pawar Medical College Hospital & Research Centre, Vasantdada Nagar, Adgaon||Nashik||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Datar Cancer Genetics Ltd, F-8, D-Road, Ambad MIDC||Nashik||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Thyrocare Technologies Limited, D37/1, TTC MIDC, Turbhe||Navi Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Sir H.N. Reliance Foundation Hospital and Research Centre, Molecular Medicine, Reliance Life Sciences Pvt. Ltd., R-282, TTC Industrial Area, Rabale||Navi Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|MGM Medical College and Hospital||Navi Mumbai||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|A.G. Diagnostics Pvt Ltd, Nayantara Building||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Sahyadri Speciality Labs, Plot No 54, S.No. 89-90, Lokmanya Colony, Kothrud||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Metropolis Healthcare Limited, Construction House, 796/189-B, Bhandarkar Institute Road||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
| Genepath Diagnostics India Pvt Ltd, 4 th Floor, Above Phadke Hospital||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Krsnaa Diagnostics Pvt Ltd, Lt. Jayabai Nanasaheb Sutar Maternity Home||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Lab Services, Ayugen Biosciences Pvt Ltd, 562/1, Shivajinagar||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|#Ruby Hall Clinic, Dept of Laboratory, Grant Medical Foundation, 40, Sassoon Road||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Molecular Diagnostic Laboratory, Department of Pathology, LMMF's Deenanath Mangeshkar Hospital and Research Center, Erandwane, ||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Dr. DY Patil Medical College Hospital and Research Centre, Pimpri||Pune||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Dept of Molecular Biology & Genetics, Krishna Institute of Medical Sciences, Karad||Satara||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Vaidya Lab Thane, Unit of Millenium Special Lab Pvt Ltd, Odyssey Park, 2 nd Floor, 201, Raghunath Nagar, Wagle Estate||Thane||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|Metropolis Healthcare Limited, Shop No.1, Ground Floor, Ahilya Building, Savarkar Marg, Thane West||Thane||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|InfeXn Laboratories Private Limited, A/131, Therelek Compound, Road No 23, Wagle Industrial Estate||Thane (W)||खाजगी संस्था ||RT-PCR
|-
|District General Hospital||Ahmednagar||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Akola||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Sant Gadge Baba Amravati University||Amravati||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Aurangabad||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Government Medical College ||Baramati||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Shree Bhausaheb Hire Govt. Medical College||Dhule||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Jalgaon||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|#RCSM Govt. Medical College||Kolhapur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Vilasrao Deshmukh Govt. Institute of Medical Sciences||Latur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Miraj||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Seth GS Medical College & KEM Hospital||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Kasturba Hospital for Infectious Diseases||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|National Institute of Virology Field Unit||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Grant Medical College & Sir JJ Hospital||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Haffkine Institute||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|National Institute for Research on Reproductive Health||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|INHS Ashvini||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*Tata Memorial Centre ACTREC||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*Tata Memorial Hospital||Mumbai||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Indira Gandhi Govt. Medical College||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|All India Institute of Medical Sciences||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Govt. Medical College||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Nagpur Veterinary College, MAFSU||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|#Intermediate Reference Laboratory||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*National Environmental Engineering Research Institute||Nagpur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Swami Ramanand Teerth Marathwada University||Nanded||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Model Rural Health Research Unit (MRHRU), Sub District Hospital, Agar, Dahanu ||Palghar||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|ICMR-National Institute of Virology||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Armed Forces Medical College||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|BJ Medical College||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Command Hospital (SC)||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|ICMR-National AIDS Research Institute||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*National Centre for Cell Sciences||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|*Indian Institute of Science Education and Research (IISER)||Pune||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|V. M. Govt. Medical College||Solapur||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Mahatma Gandhi Institute of Medical Sciences, Sevagram||Wardha||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Rajiv Gandhi Medical College & CSM Hospital, Kalwa, Thane, Mumbai||||शासकीय संस्था ||RT-PCR
|-
|Rural Medical College, Pravara Institute of Medical Sciences, Loni||Ahmednagar||खाजगी संस्था ||TrueNat
|-
|Qualilife Diagnostics, Balaji Arcade, 1st Floor, 544/A, Netaji Subhash Road, Mulund (W)||Mumbai||खाजगी संस्था ||TrueNat
|-
|Civil Surgeon, District Hospital||Parbhani||शासकीय संस्था ||TrueNat
|}
[[वर्ग:कोविड-१९ साहाय्य-पुस्तिका]]
gbejeusxptd9pr50rkfqmwu9mqm7bfx
कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र
0
3175
13190
12666
2022-08-20T14:51:00Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
अ) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ संबंधी मदत क्रमांक - १०९६
ब) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड उपचार रुग्णालये
{| class="wikitable sortable"
|-
! रुग्णालयाचे नाव !! रुग्णालयाचा प्रकार
|-
| कस्तुरबा रुग्णालय || महापालिका
|-
| नायर रुग्णालय || महापालिका
|-
| के.ई.एम. रुग्णालय || महापालिका
|-
| सायन रुग्णालय || महापालिका
|-
| हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटर (एच.बी. टी.) रुग्णालय || महापालिका
|-
| सेव्हन हिल्स रुग्णालय || महापालिका
|-
| गोकुळदास तेजपाल रुग्णालय || राज्य शासन
|-
| सेंट जॉर्ज रुग्णालय || राज्य शासन
|-
| जगजीवन राम रुग्णालय || केंद्र सरकार
|-
| मुंबई रुग्णालय (बॉम्बे रुग्णालय) || खाजगी
|-
| सैफी रुग्णालय || खाजगी
|-
|भाटिया रुग्णालय || खाजगी
|-
| जसलोक रुग्णालय || खाजगी
|-
| ब्रीच कँडी रुग्णालय || खाजगी
|-
| शुश्रुषा रुग्णालय || खाजगी
|-
| रहेजा रुग्णालय || खाजगी
|-
| लीलावती रुग्णालय || खाजगी
|-
| होली फॅमिली रुग्णालय || खाजगी
|-
| सोमय्या रुग्णालय || खाजगी
|}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title= कोविड १९ बृहन्मुंबई महानगरपालिका|दुवा=https://stopcoronavirus.mcgm.gov.in/}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:कोविड-१९ साहाय्य-पुस्तिका]]
jusjwu7mwmqzevei6k5c6i07iq64dtu
कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका/कोविड-१९संदर्भातील गैरसमज
0
3177
13186
12665
2022-08-20T14:51:00Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:कोविड-१९ : साहाय्य-पुस्तिका]] पासून काढत आहे [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
कोविड-१९संदर्भात विविध माध्यमांतून अनेक गैर समज प्रसृत होत आहेत. त्यांसंदर्भात काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
==सर्वसाधारण धोरण==
कोविड-१९शी संबंधित अनेक बाबींवर अद्याप अभ्यास चाललेला असल्याने नेमकी कोणती माहिती विश्वसनीय धरायची आणि कोणती नाही ह्याचा निर्णय घेणे सर्वसामान्य व्यक्तींसाठी कठीण आहे. तरी विविध माध्यमांतून जी माहिती प्रसृत होत असते तिच्या संदर्भात सर्वसाधारण धोरण पुढीलप्रमाणे असावे.
# कोणत्याही माध्यमात एखादा उपाय सांगितला असेल तर तो आपला आपण अनुसरू नये. असा कोणताही उपाय अनुसरण्यापूर्वी शक्यतो आपल्या वैद्यकीय मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घ्यावे.
# माहितीचा स्रोत विश्वसनीय आहे की नाही हे शक्यतो पडताळावे. उदा. जागतिक आरोग्य संघटना, केंद्रशासन, राज्यशासन ह्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर दिलेली माहिती व मार्गदर्शक सूचना ह्या एखाद्या अनुदिनीवरील वा चर्चापीठावरील माहितीच्या तुलनेत प्रमाण मानता येतील.
[[वर्ग:कोविड-१९ साहाय्य-पुस्तिका]]
mw3m2badieph51t8rnznn7swe301pbe
मिडियाविकी:Deletereason-dropdown
8
3202
13192
7912
2022-08-20T14:54:19Z
QueerEcofeminist
1879
deletion reasons with translations for better accountability
wikitext
text/x-wiki
* वगळण्याची सामान्य कारणे
** स्पॅम - Spam
** उत्पात - Vandalism
** प्रताधिकार उल्लंघन - Copyright violation
** लेखकाची(लेखिकेची) विनंती - Creator's request
** तुटकी पुनर्निर्देशने - Broken redirects
** प्रकल्पास अयोग्य मजकूर - Out of project scope
** चाचणी पान, निरुपयोगी मजकूर - Test page/ gibberish text
** एकाच नावाची अनेक पाने - Duplicate page
clkkpoxtiah44wu6ij5j7phdldv4rgk
व्हेज मन्चुरिअन
0
4003
13171
12954
2022-08-20T14:41:55Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:पाककृती]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
{{विकिबुक्स गल्लत}}
व्हेज मन्चुरिएन ही चायनीज पदार्थ आहे.
रेसिपी-
साहीत्य- १ किलो कोबी,१ फ्लावोर,१/२ किलो गाजर, सव्वाशे ग्रम ढोबळी मिरची
कृती-
[[वर्ग:पाककृती]]
dfb0ndp16sal1368gss9bg9k73dhezk
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/٘नियतकालिके
0
4019
13165
13102
2022-08-20T14:40:28Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
महाजालावरील मराठी नियतकालिके
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
2a4oowxl8s6o2vglunjfjv4oy7nws6q
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/नियतकालिके
0
4020
13169
13105
2022-08-20T14:40:28Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
महाजालावरील मराठी नियतकालिके
* विद्याशाखीय
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
q2mh7g5wtk8w9q0dd2dfel1i2vogu5g
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश
0
4021
13166
13107
2022-08-20T14:40:28Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
महाजालावरील मराठी ज्ञानकोश
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
kw9acamrxhl1giwgmvt5uvc0wb0f3av
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण
0
4022
13168
13114
2022-08-20T14:40:28Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
सर्वसाधारण ज्ञानकोश
* [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/केतकर | महाराष्ट्रीय ज्ञानकोश]]
* [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/विश्वकोश | मराठी विश्वकोश]]
* [[महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/विकिपीडिया | मराठी विकिपीडिया]]
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
0ugl8n3iak1g23dltorrtaj0pgksxd0
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/विषयविशिष्ट
0
4023
13167
13111
2022-08-20T14:40:28Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
विषयविशिष्ट ज्ञानकोश
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
7yacohf5vu1zm4a26mk14ga24ubja9b
महाजालावरील मराठी साधने/संदर्भसाधने/ज्ञानकोश/सर्वसाधारण/विकिपीडिया
0
4026
13170
13116
2022-08-20T14:40:28Z
QueerEcofeminist
1879
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले
wikitext
text/x-wiki
=मराठी विकिपीडिया=
==प्रकाशनाचे तपशील==
===खंडवार प्रकाशनवर्ष===
===इतर ज्ञात आवृत्त्या===
==ज्ञानकोशाचे स्वरूप==
==उपलब्धता==
===शोधसुकर स्वरूप===
[[वर्ग:महाजालावरील मराठी साधने]]
lbb9ku1ysayjb6kwhspp7v97emd4r59
वर्ग:ग्रंथालय शास्त्र
14
4036
13177
2022-08-20T14:46:59Z
QueerEcofeminist
1879
नवा वर्ग
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
13178
13177
2022-08-20T14:47:15Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:मूळ]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:मूळ]]
enqz9awqugu0ufc572pwznek9r7wivo
वर्ग:संत रामदास
14
4037
13179
2022-08-20T14:47:33Z
QueerEcofeminist
1879
नवा वर्ग
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
13180
13179
2022-08-20T14:47:52Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:मूळ]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:मूळ]]
enqz9awqugu0ufc572pwznek9r7wivo
वर्ग:संत ज्ञानेश्वर
14
4038
13181
2022-08-20T14:48:10Z
QueerEcofeminist
1879
नवा वर्ग
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
13182
13181
2022-08-20T14:48:22Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:नवा वर्ग]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:नवा वर्ग]]
97y4z79gis9yh7uiftfh36hd1dm5vve
13183
13182
2022-08-20T14:48:29Z
QueerEcofeminist
1879
removed [[Category:नवा वर्ग]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
13184
13183
2022-08-20T14:48:45Z
QueerEcofeminist
1879
added [[Category:मूळ]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:मूळ]]
enqz9awqugu0ufc572pwznek9r7wivo