विकिबुक्स mrwikibooks https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.20 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk तुकाराम गाथा/ १ ते ३०० 0 38 36901 36875 2026-09-19T19:41:46Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36901 wikitext text/x-wiki ''' == '''अग्रशीर्ष मजकुर''' == मगंलाचरण - अभंग 6 1 समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥1॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रह्मादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥2॥ तुका ह्मणे त्याचें कळलें आह्मां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत॥3॥ 2 सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥1॥ तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥ मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥2॥ तुका ह्मणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥3॥ 3 सदा माझे डोळे जडो तुझे मूताअ । रखुमाईच्या पती सोयरिया ॥1॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥2॥ तुका ह्मणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥3॥ 4 राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया ॥1॥ कस्तुरीमळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती ॥ध्रु.॥ मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळ ही ॥2॥ कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयानो ॥3॥ सकळ ही तुह्मी व्हा गे एकीसवा । तुका ह्मणे जीवा धीर नाहीं॥4॥ 5 कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ॥1॥ ठेविले चरण दोन्ही विटेवरी । ऐसें रूप हरी दावीं डोळां ॥ध्रु.॥ कटीं पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ॥2॥ गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥3॥ झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया ॥4॥ तुका ह्मणे माझी पुरवावी आस । विनंती उदास करूं नये ॥5॥ 6 गरुडाचें वारिकें कासे पीतांबर । सांवळें मनोहर कैं देखेन ॥1॥ बरवया बरवंटा घनमेघ सांवळा । वैजयंतीमाळा गळां शोभे ॥ध्रु.॥ मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ । कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ॥2॥ ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ । वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ॥3॥ उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वणिऩती पवाडे सनकादिक ॥4॥ तुका ह्मणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥5॥ ॥6॥ विराण्या - अभंग 25 7 वाळो जन मज ह्मणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥1॥ सांडूनि लौकिक जालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥2॥ नाइकें वचन बोलतां या लोकां । ह्मणे जालों तुका हरिरता ॥3॥ 8 आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा । ह्मणोनि व्यभिचारा टेकलियें ॥1॥ रात्रंदिस मज पाहिजे जवळी । क्षण त्यानिराळी न गमे घडी ॥2॥ नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां । रातलें अनंता तुका ह्मणे ॥3॥ 9 हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥1॥ घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रह्म ॥2॥ बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका ह्मणे ॥3॥ 10 नाहीं काम माझें काज तुह्मांसवें । होतें गुप्त ठावें केलें आतां ॥1॥ व्यभिचार माझा पडिला ठाउका । न सर ती लोकांमाजी जालें ॥2॥ न धरावा लोभ कांहीं मजविशीं । जालें देवपिशी तुका ह्मणे॥3॥ 11 विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥1॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त माझें ॥2॥ मज आतां कोणी आळवाल झणी । तुका ह्मणे कानीं बहिरी जालें ॥3॥ 12 न देखें न बोलें नाइकें आणीक । बैसला हा एक हरि चित्तीं ॥1॥ सासुरें माहेर मज नाहीं कोणी । एक केलें दोन्ही मिळोनियां॥2॥ आळ आला होता आह्मी भांडखोरी । तुका ह्मणे खरी केली मात ॥3॥ 13 दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां । हरि या अनंता पासूनिया ॥1॥ बिळयाच्या आह्मी जालों बिळवंता । करूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जिवाच्या उदारा । जालों प्रीतिकरा गोविंदासी ॥3॥ 14 क्षणभरी आह्मी सोसिलें वाईट । साधिलें अवीट निजसुख ॥1॥ सांडी मांडी मागें केल्या भरोवरी । अधिक चि परी दुःखाचिया ॥2॥ तुका ह्मणे येणें जाणें नाहीं आतां । राहिलों अनंताचिये पायीं ॥3॥ 15 आह्मां आह्मी आतां वडील धाकुटीं । नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥1॥ फावला एकांत एकविध भाव । हरि आह्मांसवें सर्व भोगी ॥2॥ तुका ह्मणे अंगसंग एके ठायीं । असों जेथें नाहीं दुजें कोणी ॥3॥ 16 सर्व सुख आह्मी भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥1॥ याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥2॥ तुका ह्मणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥3॥ 17 एका जिवें आतां जिणें जालें दोहीं । वेगळीक कांहीं नव्हे आतां ॥1॥ नारायणा आह्मां नाहीं वेगळीक । पुरविली हे भाक सांभािळली ॥2॥ तुका ह्मणे जालें सायासाचें फळ । सरली ते वेळ काळ दोन्ही ॥3॥ 18 हासों रुसों आतां वाढवूं आवडी । अंतरींची गोडी अवीट ते ॥1॥ सेवासुखें करूं विनोदवचन । आह्मी नारायण एकाएकीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जालों उदासीन । आपुल्या आधीन केला पति ॥3॥ 19 मजसवें आतां येऊं नका कोणी । सासुरवासिनी बाइयानो ॥1॥ न साहवे तुह्मां या जनाची कूट । बोलती वाइऩट ओखटें तें ॥2॥ तुका ह्मणे जालों उदास मोकळ्या । विचरों गोवळ्यासवें आह्मी ॥3॥ 20 शिकविलें तुह्मीं तें राहे तोंवरी । मज आणि हरी वियोग तों ॥1॥ प्रसंगीं या नाहीं देहाची भावना । तेथें या वचना कोण मानी ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं बैसला अनंत । दिसों नेदी नित्य अनित्य तें ॥3॥ 21 सांगतों तें तुह्मीं अइकावें कानीं । आमुचे [[नाचणी]]ं नाचूं नका ॥1॥ जोंवरी या तुह्मां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥2॥ तुका ह्मणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥3॥ 22 आजिवरी तुह्मां आह्मां नेणपण । कौतुकें खेळणें संग होता ॥1॥ आतां अनावर जालें अगुणाची । करूं नये तें चि करीं सुखें ॥2॥ तुका ह्मणे आतां बुडविलीं दोन्ही । कुळें एक मनीं नारायण ॥3॥ 23 सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥1॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥2॥ न व्हावी ते जाली आमुची भंडाई । तुका ह्मणे काई लाजों आतां ॥3॥ 24 मरणाही आधीं राहिलों मरोनी । मग केलें मनीं होतें तैसें ॥1॥ आतां तुह्मी पाहा आमुचें नवल । नका वेचूं बोल वांयांविण ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी भयाभीत नारी । कैसे संग सरी तुह्मां आह्मां ॥3॥ 25 परपुरुषाचें सुख भोगे तरी । उतरोनि करीं घ्यावें सीस ॥1॥ संवसारा आगी आपुलेनि हातें । लावूनि मागुतें पाहूं नये ॥2॥ तुका ह्मणे व्हावें तयापरी धीट । पतंग हा नीट दीपासोई ॥3॥ 26 अइकाल परी ऐसें नव्हे बाई । न संडा या सोई भ्रताराची ॥1॥ नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविलें तें ॥2॥ तुका ह्मणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशीं ॥3॥ 27 आहांच वाहांच आंत वरी दोन्ही । न लगा गडणी आह्मां तैशा ॥1॥ भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा । आवरूनि मना बंद द्यावा ॥2॥ तुका ह्मणे कांहीं अभ्यासावांचुनी । नव्हे हे करणी भलतीची ॥3॥ 28 बहुतांच्या आह्मी न मिळों मतासी । कोणी कैसी कैसी भावनेच्या ॥1॥ विचार करितां वांयां जाय काळ । लटिकें तें मूळ फजितीचें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी करा घटापटा । नका जाऊं वाटा आमुचिया ॥3॥ 29 त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा । कठिण हें जिवा तोंचिवरी ॥1॥ मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा । अंतर हें संगा नेदी पुढें ॥2॥ तुका ह्मणे सर्वविशीं हा संपन्न । जाणती महिमान श्रुति ऐसें ॥3॥ 30 न राहे रसना बोलतां आवडी । पायीं दिली बुडी माझ्या मनें ॥1॥ मानेल त्या तुह्मी अइका स्वभावें । मी तों माझ्याभावें अनुसरलें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मीं फिरावें बहुतीं । माझी तों हे गती जाली आतां ॥3॥ 31 न बोलतां तुह्मां कळों न ये गुज । ह्मणउनी लाज सांडियेली ॥1॥ आतां तुह्मां पुढें जोडीतसें हात । नका कोणी अंत पाहों माझा ॥2॥ तुका ह्मणे आह्मी बैसलों शेजारीं । करील तें हरी पाहों आतां ॥3॥ ॥25॥ 32 नये जरी तुज मधुर उत्तर । दिधला सुस्वर नाहीं देवें ॥1॥ नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल । येइल तैसा बोल रामकृष्ण ॥ध्रु.॥ देवापाशीं मागें आवडीची भक्ति । विश्वासेंशीं प्रीति भावबळें ॥2॥ तुका ह्मणे मना सांगतों विचार । धरावा निर्धार दिसेंदिस ॥3॥ 33 सावध जालों सावध जालों । हरिच्या आलों जागरणा ॥1॥ तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥ पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥2॥ तुका ह्मणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥3॥ 34 आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥1॥ कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥ गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥3॥ 35 अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥1॥ देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥ध्रु.॥ आपुल्या वैभवें । शृंगारावें निर्मळ ॥2॥ तुका ह्मणे जेवी सवें । प्रेम द्यावें प्रीतीचें ॥3॥ 36 सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥1॥ आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा ह्मणे भिडा ॥ध्रु.॥ निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥2॥ गेले वारीं तुह्मीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥3॥ अखंड मज पोटाची व्यथा । दुध[[भात]] साकर [[तूप]] पथ्या ॥4॥ दो पाहरा मज लहरी येती। शुद्ध नाहीं पडे सुपती ॥5॥ नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥6॥ अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥7॥ हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुह्मां नेणवे कैसें ॥8॥ तुका ह्मणे जिता गाढव केला । मेलियावरि नरका नेला ॥9॥ 37 पावलें पावलें तुझें आह्मां सर्व । दुजा नको भाव होऊं देऊं ॥1॥ जेथें तेथें तुझीं च पाउलें । त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ॥ध्रु.॥ भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद । आह्मां नको वाद त्यांशीं देऊं ॥2॥ तुका ह्मणे अणु तुजविण नाहीं । नभाहूनि पाहीं वाढ आहे ॥3॥ 38 वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी । पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ॥1॥ अमुप हे गांठीं बांधूं भांडवल । अनाथा विठ्ठल आह्मां जोगा ॥ध्रु.॥ अवघे होती लाभ एका या चिंतनें । नामसंकीर्तनें गोविंदाच्या ॥2॥ जन्ममरणाच्या खुंटतील खेपा । होईल हा सोपा सिद्ध पंथ ॥3॥ गेले पुढें त्यांचा शोधीत मारग । चला जाऊं माग घेत आह्मी ॥4॥ तुका ह्मणे घालूं जीवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया॥5॥ 39 जेविले ते संत मागें उष्टावळी । अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ॥1॥ सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा । पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ॥ध्रु.॥ परें परतें मज न लागे सांगावें । हें तों देवें बरें शिकविलें ॥2॥ दुसऱ्यातें आह्मी नाहीं आतळत । जाणोनि संकेत उभा असे ॥3॥ येथें कोणीं कांहीं न धरावी शंका । मज चाड एका भोजनाची ॥4॥ लांचावला तुका मारितसे झड । पुरविलें कोड नारायणें ॥5॥ 40 देवाच्या प्रसादें करा रे भोजन । व्हाल कोण कोण अधिकारी ते ॥1॥ ब्रह्मादिकांसि हें दुर्लभ उिच्छष्ट । नका मानूं वीट ब्रह्मरसीं ॥ध्रु.॥ अवघियां पुरतें वोसंडलें पात्र । अधिकार सर्वत्र आहे येथें ॥2॥ इच्छादानी येथें वळला समर्थ । अवघें चि आर्त पुरवितो ॥3॥ सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं । पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ॥4॥ तुका ह्मणे पाक लक्षुमीच्या हातें । कामारीसांगातें निरुपम॥5॥ 41 अवगुणांचे हातीं । आहे अवघी फजीती ॥1॥ नाहीं पात्रासवें चाड । प्रमाण तें फिकें गोड ॥ध्रु.॥ विष तांब्या [[वाटी]] । भरली लावूं नये होटीं ॥2॥ तुका ह्मणे भाव । शुद्ध बरा सोंग वाव ॥3॥ 42 हरीच्या जागरणा । जातां कां रे नये मना ॥1॥ कोठें पाहासील तुटी । आयुष्य वेचे फुकासाटीं ॥2॥ ज्यांची तुज गुंती । ते तों मोकलिती अंतीं ॥2॥ तुका ह्मणे बरा । लाभ काय तो विचारा ॥3॥ 43 धर्माची तूं मूर्ती । पाप पुण्य तुझे हातीं ॥1॥ मज सोडवीं दातारा । कर्मापासूनि दुस्तरा ॥ध्रु.॥ करिसी अंगीकार । तरी काय माझा भार ॥2॥ जिवींच्या जीवना । तुका ह्मणे नारायणा ॥3॥ 44 ब्रह्मादिक जया लाभासि ठेंगणे । बळिये आह्मी भले शरणागत ॥1॥ कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ । जाला पद्मनाभ सेवाॠणी ॥ध्रु.॥ कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं । इच्छेचिये वाही वरुषावे ॥2॥ बैसलिये ठायीं लागलें भरतें । त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ॥3॥ हरि नाहीं आह्मां विष्णुदासां जगीं । नारायण अंगीं विसावला ॥4॥ तुका ह्मणे बहु लाटे हें भोजन । नाहीं रिता कोण राहत राहों ॥5॥ 45 दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि ॥ आपणाबाहेरी। न लगे ठाव धुंडावा ॥1॥ इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥ देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ॥2॥ तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ॥ आहेसि तूं आगा। अंगीं डोळे उघडी ॥3॥ 46 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥1॥ अइका जी तुह्मी भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥ कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥2॥ तुका ह्मणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥3॥ 47 आह्मी जरी आस । जालों टाकोनि उदास ॥1॥ आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥ भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥2॥ तुमचें तुह्मांपासीं । आह्मी आहों जैसीं तैसीं ॥3॥ गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥4॥ तुका ह्मणे चित्तीं। नाहीं वागवीत खंती ॥5॥ 48 निंदी कोणी मारी । वंदी कोणी पूजा करी ॥1॥ मज हें ही नाहीं तें ही नाहीं । वेगळा दोहीं पासुनी ॥ध्रु.॥ देहभोग भोगें घडे। जें जें जोडे तें बरें ॥2॥ अवघें पावे नारायणीं । जनार्दनीं तुक्याचें ॥3॥ 49 जन विजन जालें आह्मां । विठ्ठलनामा प्रमाणें ॥1॥ पाहें तिकडे बापमाय । विठ्ठल आहे रखुमाई ॥ध्रु.॥ वन पट्टण एकभाव। अवघा ठाव सरता जाला ॥2॥ आठव नाहीं सुखदुःखा । नाचे तुका कौतुकें ॥3॥ 50 हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥1॥ तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥ मोहरा होय तोचि अंगें। सूत न जळे ज्याचे संगें ॥2॥ तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥3॥ 51 आलिंगनें घडे । मोक्ष सायुज्यता जोडे ॥1॥ ऐसा संताचा महिमा । जाली बोलायाची सीमा ॥ध्रु.॥ तीर्थे पर्वकाळ । अवघीं पायांपें सकळ ॥2॥ तुका ह्मणे देवा । त्यांची केली पावे सेवा ॥3॥ 52 माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥1॥ भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥ टािळलें निमित्त । फार थोडें घात हित ॥2॥ यावें कामावरी । तुका ह्मणे नाहीं उरी ॥3॥ 53 सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥ निंदा हिंसा नाहीं कपट देहबुिद्ध । निर्मळ स्फटिक जैसा ॥1॥ मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें॥ तीर्थांसी तीर्थ जाला तो चि एक । मोक्ष तेणें दर्शनें ॥ध्रु.॥ मन शुद्ध तया काय करिसी माळा । मंडित सकळा भूषणांसी ॥ हरिच्या गुणें गर्जताती सदा । आनंद तया मानसीं ॥2॥ तन मन धन दिलें पुरुषोत्तमा । आशा नाहीं कवणाची ॥ तुका ह्मणे तो परिसाहूनि आगळा । काय महिमा वर्णूं त्याची ॥3॥ 54 आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण । न कळतां मन दुजें भावी ॥1॥ ह्मणउनी पाठी लागतील भूतें । येती गवसीत पांचजणें ॥ध्रु.॥ ज्याचे त्या वंचलें आठव न होतां । दंड या निमित्ताकारणें हा ॥2॥ तुका ह्मणे काळें चेंपियेला गळा । मी मी वेळोवेळा करीतसे ॥3॥ 55 महारासि सिवे । कोपे ब्राह्मण तो नव्हे ॥1॥ तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥ नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥2॥ ज्याचा संग चित्तीं । तुका ह्मणे तो त्या याती ॥3॥ 56 तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥1॥ आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥ नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥2॥ शेजारणीच्या गेली रागें ।कुत†यांनी घर भरिलें मागें ॥3॥ पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥4॥ तुका ह्मणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥5॥ 57 मज दास करी त्यांचा । संतदासांच्या दासांचा ॥1॥ मग होत कल्पवरी । सुखें गर्भवास हरी ॥ध्रु.॥ नीचवृत्तिकाम । परी मुखीं तुझें नाम ॥2॥ तुका ह्मणे सेवे । माझे संकल्प वेचावे ॥3॥ 58 सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥1॥ त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥2॥ नेणे शब्द पर । तुका ह्मणे परउपकार ॥3॥ 59 जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत शव लोकीं ॥1॥ त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥ जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥2॥ जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥3॥ विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥4॥ तुका ह्मणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥5॥ 60 आह्मी सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके ॥ जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥1॥ नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा ॥ थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥ अक्षय साचार । केलें सायासांनी घर ॥ एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥2॥ धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी ॥ जतन तीं करी । कोणगुरें वासरें ॥3॥ जाली सकळ नििंश्चती । भांडवल शेण माती । झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥4॥ तुका ह्मणे देवा । अवघा निरविला हेवा ॥ कुटुंबाची सेवा । तो चि करी आमुच्या ॥5॥ 61 पराविया नारी माउलीसमान । मानिलिया धन काय वेचे ॥1॥ न करितां परनिंदा द्रव्य अभिलाष । काय तुमचें यास वेचे सांगा ॥ध्रु.॥ बैसलिये ठायी ह्मणतां रामराम । काय होय श्रम ऐसें सांगा ॥2॥ संताचे वचनीं मानितां विश्वास । काय तुमचें यास वेचे सांगा ॥3॥ खरें बोलतां कोण लागती सायास । काय वेचे यास ऐसें सांगा ॥4॥ तुका ह्मणे देव जोडे याचसाटीं । आणीक ते आटी न लगे कांहीं ॥5॥ 62 शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥1॥ मुखीं अमृताची वाणी । देह वेचावा कारणीं ॥ध्रु.॥ सर्वांगीं निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ ॥2॥ तुका ह्मणे जाती । ताप दर्शनें विश्रांती ॥3॥ 63 चित्त समाधानें । तरी विष वाटे सोनें ॥1॥ बहु खोटा अतिशय । जाणां भले सांगों काय ॥ध्रु.॥ मनाच्या तळमळें । चंदनें ही अंग पोळे ॥2॥ तुका ह्मणे दुजा । उपचार पीडा पूजा ॥3॥ 64 परिमळ ह्मूण चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥1॥ मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥2॥ कर्मफळ ह्मणुनी इच्छूं नये काम । तुका ह्मणे वर्म दावूं लोकां ॥3॥ 65 माया तें चि ब्रह्म ब्रह्म तेंचि माया । अंग आणि छाया तया परी ॥1॥ तोडितां न तुटे सारितां निराळी । लोटांगणांतळीं हारपते ॥ध्रु.॥ दुजें नाहीं तेथें बळ कोणासाठीं । आणिक ते आटी विचाराची ॥2॥ तुका ह्मणे उंच वाढे उंचपणें । ठेंगणीं लवणें जैसीं तैसीं ॥3॥ 66 दुर्जनासि करी साहे । तो ही दंड हे लाहे ॥1॥ शिंदळीच्या कुंटणी वाटा । संग खोटा खोट्याचा ॥ध्रु.॥ येर येरा कांचणी भेटे। आगी उठे तेथूनी ॥2॥ तुका ह्मणे कापूं नाकें । पुढें आणिकें शिकविती ॥3॥ 67 वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपाजिऩती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥1॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥ देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥2॥ तुका ह्मणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥3॥ 68 पवित्र सोंवळीं । एक तीं च भूमंडळीं ॥1॥ ज्यांचा आवडता देव । अखंडित प्रेमभाव ॥ध्रु.॥ तीं च भाग्यवंतें । सरतीं पुरतीं धनवित्तें ॥2॥ तुका ह्मणे देवा । त्यांची केल्या पावे सेवा ॥3॥ 69 आशाबद्ध जन । काय जाणे नारायण ॥1॥ करी इंद्रियांची सेवा । पाहे आवडीचा हेवा ॥ध्रु.॥ भ्रमलें चावळे । तैसें उचित न कळे ॥2॥ तुका ह्मणे विषें । अन्न नाशियलें जैसें ॥3॥ 70 ढेकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥1॥ हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥ गव्हांचिया होती परी । फके वरी खाऊं नये ॥2॥ तुकां ह्मणे असे हातींचें कांकण । तयासी दर्पण विल्हाळक ॥3॥ 71 करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥1॥ कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ध्रु.॥ अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥2॥ तुका ह्मणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥3॥ 72 एकादशीव्रत सोमवार न करिती । कोण त्यांची गति होइल नेणों ॥1॥ काय करूं बहु वाटे तळमळ । आंधळीं सकळ बहिर्मुख ॥ध्रु.॥ हरिहरां नाहीं बोटभरी वाती । कोण त्यांची गति होईल नेणों ॥2॥ तुका ह्मणे नाहीं नारायणीं प्रीति । कोण त्यांची गति होइल नेणों ॥3॥ 73 नव्हे आराणूक संवसारा हातीं । सर्वकाळ चित्तीं हा चि धंदा ॥1॥ देवधर्म सांदीं पडिला सकळ । विषयीं गोंधळ गाजतसे ॥ध्रु. ॥ रात्रि दीस न पुरे कुटुंबाचें समाधान । दुर्लभ दर्शन ईश्वराचें ॥2॥ तुका ह्मणे आत्महत्या रे घातकी । थोर होते चुकी नारायणीं ॥3॥ 74 स्मशान ते भूमि प्रेतरूप जन । सेवाभक्तिहीन ग्रामवासी ॥1॥ भरतील पोट श्वानाचिया परी । विस्त दिली घरीं यमदूतां ॥ध्रु.॥ अपूज्य लिंग तेथें अतित न घे थारा । ऐसी वस्ती चोरां कंटकांची ॥2॥ तुका ह्मणे नाहीं ठावी स्थिति मती । यमाची निश्चिती कुळवाडी ॥3॥ 75 आहाकटा त्याचे करिती पितर । वंशीं दुराचार पुत्र जाला ॥1॥ गळे चि ना गर्भ नव्हे चि कां वांज । माता त्याची लाजलावा पापी ॥ध्रु. ॥ परपीडें परद्वारीं सावधान । सादर चि मन अभाग्याचें ॥2॥ न मिळतां निंदा चाहडी उपवास । संग्रहाचे दोष सकळ ही ॥3॥ परउपकार पुण्य त्या वावडें । विषाचें तें कीडें दुग्धीं मरे ॥4॥ तुका ह्मणे विटाळाची च तो मूर्ति । दया क्षमा शांति नातळे त्या ॥5॥ 76 श्वान शीघ्रकोपी । आपणा घातकर पापी ॥1॥ नाहीं भीड आणि धीर । उपदेश न जिरे क्षीर ॥ध्रु. ॥ माणसांसि भुंके । विजातीनें द्यावे थुंके ॥2॥ तुका ह्मणे चित्त । मळिण करा तें फजित ॥3॥ 77 देखोनि हरखली अंड । पुत्र जाला ह्मणे रांड ॥ तंव तो जाला भांड । चाहाड चोर शिंदळ ॥1॥ जाय तिकडे पीडी लोकां। जोडी भांडवल थुंका ॥ थोर जाला चुका । वर कां नाहीं घातली ॥ध्रु.॥ भूमि कांपे त्याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ॥निष्ठ‍उत्तरें। पापदृष्टी मळिणचित्त ॥2॥ दुराचारी तो चांडाळ । पाप सांगातें विटाळ । तुका ह्मणे खळ । ह्मणोनियां निषिद्ध तो ॥3॥ 78 नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥1॥ नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥2॥ तुका ह्मणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया॥3॥ 79 माझी पाठ करा कवी । उट लावी दारोदार ॥1॥ तंव तया पारखी सिव । लाजे ठाव सांडितां ॥ध्रु. ॥ उष्टावळी करूनि जमा । कुंथुनि प्रेमा आणितसे ॥2॥ तुका ह्मणे बाहेरमुदी । आहा च गोविंदीं न सरती ॥3॥ 80 उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥1॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु. ॥ काय नाहीं देवें करूनि ठेविलें । असें तें आपुलें ते ते ठायीं ॥2॥ तुका ह्मणे जेव्हां गेला अहंकार । तेव्हां आपपर बोळविले ॥3॥ 81 योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥1॥ अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु. ॥ मिरासीचें ह्मूण सेत। नाहीं देत पीक उगें ॥2॥ तुका ह्मणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥3॥ 82 न ये नेत्रां जळ । नाहीं अंतरीं कळवळ ॥1॥ तों हे चावटीचे बोल । जन रंजवणें फोल ॥ध्रु. ॥ न फळे उत्तर । नाहीं स्वामी जों सादर ॥2॥ तुका ह्मणे भेटी । जंव नाहीं दृष्टादृष्टी ॥3॥ 83 बाईल सवासिण आई । आपण पितरांचे ठायीं ॥1॥ थोर वेच जाला नष्टा । अवघ्या अपसव्य चेष्टा ॥ध्रु. ॥ विषयांचे चरवणीं । केली आयुष्याची गाळणी ॥2॥ तुका ह्मणे लंडा । नाहीं दया देव धोंडा ॥3॥ 84 दानें कांपे हात । नाव तेविशीं मात ॥1॥ कथी चावटीचे बोल । हिंग क्षीरीं मिथ्या फोल ॥ध्रु.॥ न वजती पाप । तीर्था ह्मणे वेचूं काय ॥2॥ तुका ह्मणे मनीं नाहीं । न ये आकारातें कांहीं ॥3॥ 85 वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥1॥ निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥ न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥2॥ सांडी थोरपणा । तुका ह्मणे सवें दीना ॥3॥ 86 मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥1॥ आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥ नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥2॥ धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥3॥ कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥4॥ तंववरि मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥5॥ तुका ह्मणे बापा । चुकवीं चौ†याशींच्या खेपा ॥6॥ 87 कानडीनें केला म†हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥1॥ तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥ तिनें पाचारिलें इल बा ह्मणोन । येरु पळे आण जाली आतां ॥2॥ तुका ह्मणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥3॥ 88 सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥1॥ धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥ नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥2॥ तुका ह्मणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥3॥ 89 बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥1॥ जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥ जळो त्याचें तोंड। नको दृष्टीपुढें भांड ॥2॥ तुका ह्मणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥3॥ 90 [[तीळ]] जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥1॥ कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥ मानदंभासाठीं। केली अक्षरांची आटी ॥2॥ तप करूनि तीर्थाटन । वाढविला अभिमान ॥3॥ वांटिलें तें धन । केली अहंता जतन ॥4॥ तुका ह्मणे चुकलें वर्म । केला अवघा चि अधर्म ॥5॥ 91 संवसारतापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥1॥ ह्मणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥ बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥2॥ वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥3॥ बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस जालों कासाविस ॥4॥ तुका ह्मणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥5॥ 92 भक्तॠणी देव बोलती पुराणें । निर्धार वचनें साच करीं ॥1॥ मागें काय जाणों अइकिली वार्त्ता । कबिर सातें जातां घडिया वांटी ॥ध्रु.॥ माघारिया धन आणिलें घरासि । न घे केला त्यासि त्याग तेणें ॥2॥ नामदेवाचिया घरासि आणिलें । तेणें लुटविलें द्विजां हातीं ॥3॥ प्रत्यक्षासि काय द्यावें हें प्रमाण । व्यंकोबाचें ॠण फेडियेलें ॥4॥ बीज दळोनियां केली आराधना । लागे नारायणा पेरणें तें ॥5॥ तुका ह्मणे नाहीं जयासि निर्धार । नाडला साचार तो चि एक ॥6॥ 93 भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ॥1॥ ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ॥ध्रु.॥ देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ॥2॥ तुका ह्मणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ॥3॥ 94 भोरप्यानें सोंग पालटिलें वरी । ध्यान धरी मत्स्या जैसें ॥1॥ टिळे माळा मैंद मुद्रा लावी अंगीं । देखों नेदि जगीं फांसे जैसे ॥ध्रु.॥ ढीवर या मत्स्या चारा घाली जैसा । भीतरील फांसा कळों नेदी ॥2॥ खाटिक हा स्नेहवादें पशु पाळी । कापावया नळी तया साठीं ॥3॥ तुका ह्मणे तैसा भला मी लोकांत । परी तूं कृपावंत पांडुरंगा ॥4॥ 95 गेली वीरसरी । मग त्यासि रांड मारी ॥1॥ मग नये तैसी सत्ता । गेली मागील आणितां ॥ध्रु.॥ भंगलिया चित्ता । न ये काशानें सांदितां ॥2॥ तुका ह्मणे धीर । भंगलिया पाठीं कीर ॥3॥ 96 युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥1॥ कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देइल भेटी ॥ध्रु.॥ न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥2॥ तुका ह्मणे मज आणि उपाव । दिसती ते वाव नामाविण ॥3॥ 97 कंठीं कृष्णमणी । नाहीं अशुभ ते वाणी ॥1॥ हो का नर अथवा नारी । रांड तयें नावें खरी ॥ध्रु.॥ नाहीं हातीं दान । शूरपणाचें कांकण ॥2॥ वाळियेली संतीं । केली बोडोनि फजिती ॥3॥ तुका ह्मणे ताळा । नाहीं त्याची अवकळा ॥4॥ 98 माया ब्रह्म ऐसें ह्मणती धर्मठक । आपणासरिसे लोक नागविले ॥1॥ विषयीं लंपट शिकवी कुविद्या । मनामागें नांद्या होऊनि फिरे ॥ध्रु.॥ करुनी खातां पाक जिरे सुरण राई । करितां अतित्याई दुःख पावे ॥2॥ औषध द्यावया चाळविलें बाळा । दावूनियां गुळा दृष्टीपुढें ॥3॥ तरावया आधीं शोधा वेदवाणी । वांजट बोलणीं वारा त्यांचीं ॥4॥ तुका ह्मणे जयां पिंडाचें पाळण। न घडे नारायणभेट तयां ॥5॥ 99 मृगजळ दिसे साचपणा ऐसें । खोटियाचें पिसें ऊर फोडी ॥1॥ जाणोन कां करा आपुलाले घात । विचारा रे हित लवलाहीं ॥ध्रु.॥ संचित सांगातीं बोळवणें सवें । आचरलें द्यावें फळ तेणें ॥2॥ तुका ह्मणे शेखी श्मशान तोंवरी । संबंध गोवरी अंगीं सवें ॥3॥ 100 गौळीयाची ताकपिरें । कोण पोरें चांगलीं ॥1॥ येवढा त्यांचा छंद देवा । काय सेवा भक्ती ते ॥ध्रु.॥ काय उपास पडिले होते । कण्याभोंवते विदुराच्या ॥2॥ तुका ह्मणे कुब्जा दासी । रूपरासी हीनकळा ॥3॥ 101 आतां तरी पुढें हा चि उपदेश । नका करूं नाश आयुष्याचा ॥1॥ सकळांच्या पायां माझें दंडवत । आपुलालें चित्त शुद्ध करा ॥ध्रु.॥ हित तें करावे देवाचें चिंतन । करूनियां मन एकविध ॥2॥ तुका ह्मणे लाभ होय तो व्यापार । करा काय फार शिकवावें ॥3॥ 102 भHाविण देवा । कैंचें रूप घडे सेवा ॥1॥ शोभविलें येर येरां । सोनें एके ठायीं हिरा ॥ध्रु.॥ देवाविण भHा । कोण देता निष्कामता ॥2॥ तुका ह्मणे बाळ । माता जैसें स्नेहजाळ ॥3॥ 103 विश्वाचा जनिता । ह्मणे यशोदेसि माता ॥1॥ ऐसा भHांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥ निष्काम निराळा। गोपी लावियेल्या चाळा ॥2॥ तुका ह्मणे आलें । रूपा अव्यH चांगलें ॥3॥ 104 काय दिनकरा । केला कोंबडएानें खरा ॥1॥ कां हो ऐसा संत ठेवा । भार माझे माथां देवा ॥ध्रु.॥ आडविलें दासीं । तरि कां मरती उपवासी ॥2॥ तुका ह्मणे हातीं । कळा सकळ अनंतीं ॥3॥ 105 जेवितां ही घरी । नाक हागतिया परी ॥1॥ ऐसियाचा करी चाळा । आपुली च अवकळा ॥ध्रु.॥ सांडावें मांडावें । काय ऐसें नाहीं ठावें ॥2॥ तुका ह्मणे करी । ताका दुधा एक सरी ॥3॥ 106 हो का पुत्र पत्नी बंधु । त्यांचा तोडावा संबंधु ॥1॥ कळों आलें खटएाळसें । शिवों नये लिंपों दोषें ॥ध्रु.॥ फोडावें मडकें। मेलें लेखीं घायें एकें ॥2॥ तुका ह्मणे त्यागें । विण चुकीजेना भोगें ॥3॥ 107 व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥1॥ कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥ कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मिळण वरी ॥2॥ तुका ह्मणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥3॥ 108 जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥1॥ येर िप्रया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥ प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥2॥ तुका ह्मणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥3॥ 109 मान अपमान गोवे । अवघे गुंडूनी ठेवावे ॥1॥ हें चि देवाचें दर्शन । सदा राहे समाधान ॥ध्रु.॥ शांतीची वसती । तेथें खुंटे काळगती ॥2॥ आली ऊर्मी साहे । तुका ह्मणे थोडें आहे ॥3॥ 110 थोडें आहे थोडें आहे । चित्त साहे जालिया ॥1॥ हर्षामर्ष नाहीं अंगीं । पांडुरंगीं सरलें तें ॥ध्रु.॥ अवघ्या साधनांचें सार। न लगे फार शोधावें ॥2॥ तुका ह्मणे लटिकें पाहें । सांडीं देह अभिमान ॥3॥ 111 आतां उघडीं डोळे । जरी अद्यापि न कळे ॥ तरी मातेचिये खोळे । दगड आला पोटासि ॥1॥ मनुष्यदेहा ऐसा निध। साधिली ते साधे सिद्ध ॥ करूनि प्रबोध । संत पार उतरले ॥ध्रु.॥ नाव चंद्रभागे तीरीं । उभी पुंडलीकाचे द्वारीं ॥ कट धरूनियां करीं । उभाउभी पालवी ॥2॥ तुका ह्मणे फुकासाठीं । पायीं घातली या मिठी ॥ होतो उठाउठी । लवकरी च उतार ॥3॥ 112 न करीं संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥1॥ या नांवें अद्वैत खरें ब्रह्मYाान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥ इंिद्रयांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥2॥ तुका ह्मणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥3॥ 113 पंढरीचा महिमा । देतां आणीक उपमा ॥1॥ ऐसा ठाव नाहीं कोठें । देव उभाउभी भेटे ॥ध्रु.॥ आहेति सकळ । तीथॉ काळें देती फळ ॥2॥ तुका ह्मणे पेठ । भूमिवरी हे वैकुंठ ॥3॥ 114 तिथाअ धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ॥1॥ मिळालिया संतसंग । समपिऩतां भलें अंग ॥ध्रु.॥ तीथाअ भाव फळे । येथें आनाड तें वळे ॥2॥ तुका ह्मणे पाप । गेलें गेल्या कळे ताप ॥3॥ 115 घेऊनियां चक्र गदा । हा चि धंदा करी तो ॥1॥ भHा राखेे पायापासीं । दुर्जनासी संहारी ॥ध्रु.॥ अव्यH तें आकारलें। रूपा आलें गुणवंत ॥2॥ तुका ह्मणे पुरवी इच्छा । जया तैसा विठ्ठल ॥3॥ 116 देखोनि पुराणिकांची दाढी । रडे काुंफ्दे नाक ओढी ॥1॥ प्रेम खरें दिसे जना । भिन्न अंतरीं भावना ॥ध्रु.॥ आवरितां नावरे । खुर आठवी नेवरे ॥2॥ बोलों नयें मुखावाटां । ह्मणे होतां ब्यांचा तोटा ॥3॥ दोन्ही सिंगें चारी पाय । खुणा दावी ह्मणे होय ॥4॥ मना आणितां बोकड । मेला त्याची चरफड ॥5॥ होता भाव पोटीं। मुखा आलासे शेवटीं ॥6॥ तुका ह्मणे कुडें । कळों येतें तें रोकडें ॥7॥ 117 दुर्जनाची गंधी विष्ठेचिया परी । देखोनियां दुरी व्हावें तया ॥1॥ अइका हो तुह्मी मात हे सज्जन । करूं संघष्टन नये बोलों ॥ध्रु.॥ दुर्जनाचे अंगीं अखंड विटाळ । वाणी रजस्वला स्रवे तैशी ॥2॥ दुर्जनाचें भय धरावें त्यापरी । पिसाळलेवरी धांवे श्वान ॥3॥ दुर्जनाचा भला नव्हे अंगसंग । बोलिलासे त्याग देशाचा त्या ॥4॥ तुका ह्मणे किती सांगावें पृथक । अंग कुंभीपाक दुर्जनाचें ॥5॥ 118 अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ॥1॥ वेद श्रुति नाहीं ग्रंथ ज्या प्रमाण । श्रेष्ठाचें वचन न मानी जो ॥ध्रु.॥ तुका ह्मणे मद्यपानाचें मिष्टान्न । तैसा तो दुर्जन शिवों नये ॥2॥ 119 शब्दा नाहीं धीर । ज्याची बुिद्ध नाहीं िस्थर ॥1॥ त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥ संतास जो निंदी। अधम लोभासाठीं वंदी ॥2॥ तुका ह्मणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥3॥ 120 चोरें चोरातें करावा उपदेश । आपुला अभ्यास असेल तो ॥1॥ शिंदळीच्या मागें वेचितां पाउलें । होइऩल आपुलें तिच्या ऐसें ॥ध्रु.॥ तुका ह्मणे भितो पुढिलिया दत्ता । ह्मणऊनि चिंता उपजली ॥2॥ 121 मांडवाच्या दारा । पुढें आणिला ह्मातारा ॥1॥ ह्मणे नवरी आणा रांड । जाळा नव†याचें तोंड ॥ध्रु.॥ समय न कळे । काय उपयोगीं ये वेळे ॥2॥ तुका ह्मणे खरा । येथूनिया दूर करा ॥3॥ 122 कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥ वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥1॥ त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥ अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥ पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥2॥ पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥3॥ कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥ यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥4॥ तुका ह्मणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी । देवा विसरूनी । गेलीं ह्मणतां मी माझें ॥5॥ 123 कन्या गो करी कथेचा विकरा । चांडाळ तो खरा तया नांवें ॥1॥ गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण । यातिशीं कारण नाहीं देवा ॥2॥ आशाबद्ध नये करूं तें करिती । तुका ह्मणे जाती नरकामधीं ॥3॥ 124 हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥1॥ एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥ भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥2॥ उजवें वामांग । तुका ह्मणे एक चि अंग ॥3॥ 125 वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति जाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥1॥ शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥ पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आYाा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥2॥ वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी तीं नीच ॥3॥ सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥4॥ सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका ह्मणे जाण। तुह्मी संत तदथाअ ॥5॥ 126 घरीं रांडा पोरें मरती उपवासीं । सांगे लोकांपासीं थोरपण ॥1॥ नेऊनियां घरा दाखवावें काय । काळतोंडा जाय चुकावूनि ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जाणों त्या प्रमाण । ठकावे हे जन तैसे नहों ॥3॥ जोहार - अभंग 3 127 मायबाप जोहार । सारा साधावया आलों वेसकर ॥1॥ मागील पुढील करा झाडा । नाहीं तरी खोडा घालिती जी ॥ध्रु.॥ फांकुं नका रुजू जालिया वांचून । सांगा जी कोण घरीं तीं धण्या ॥2॥ आजि मायबाप करा तडामोडी । उद्यां कोणी घडी राहेना हो ॥3॥ तुका ह्मणे कांहीं न चले ते बोली । अखरते सालीं झाडा घेती ॥4॥ 128 येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥1॥ जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥2॥ तुका ह्मणे उद्यां लावीन ह्मनेरा । जे हे दारोदारांभोंवतीं फिरा ॥3॥ 129 देती घेती परज गेली । घर खालीं करूनियां ॥1॥ धांवणियाचे न पडे हातीं । खादली राती काळोखी ॥ध्रु.॥ वघियांचे अवघें नेलें । काहीं ठेविलें नाहीं मागें ॥2॥ सोंग संपादुनि दाविला भाव । गेला आधीं माव वरि होती ॥3॥ घराकडे पाहूं नये सें चि जालें । अमानत केलें दिवाणांत ॥4॥ आतां तुका कोणा न लगे चि हातीं । जाली ते नििश्चती बोलों नये ॥5॥ ॥3॥ 130 शुकसनकादिकीं उभारिला बाहो । परििक्षतीला हो दिसां सातां ॥1॥ उठाउठी करी स्मरणाचा धांवा । धरवत देवा नाहीं धीर ॥ध्रु.॥ त्वरा जाली गरुड टाकियेला मागें । द्रौपदीच्या लागें नारायणें ॥2॥ तुका ह्मणे करी बहु च तांतडी । प्रेमाची आवडी लोभ फार ॥3॥ 131 बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥1॥ वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याइऩ जीवें नाश पावे ॥ध्रु.॥ निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभािळतां वरि आंत चरे ॥2॥ तुका ह्मणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥3॥ 132 माकडें मुठीं धरिलें फुटाणे । गुंतले ते नेणे हात तेथें ॥1॥ काय तो तयाचा लेखावा अन्याय । हित नेणे काय आपुलें तें ॥ध्रु.॥ शुकें निळकेशीं गोवियेले पाय । विसरोनि जाय पक्ष दोन्ही ॥2॥ तुका ह्मणे एक ऐसे पशुजीव । न चले उपाव कांहीं तेथें ॥3॥ 133 हरि तूं निष्ठ‍ निर्गुण । नाहीं माया बहु कठिण । नव्हे तें करिसी आन । कवणें नाहीं केलें तें ॥1॥ घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव । राज्य घोडे भाग्य सर्व । पुत्र पत्नी जीव । डोंबाघरीं वोपविलीं ॥ध्रु.॥ नळा दमयंतीचा योग । बिघडिला त्यांचा संग । ऐसें जाणे जग । पुराणें ही बोलती ॥2॥ राजा शिबी चक्रवर्ती । कृपाळु दया भूतीं । तुळविलें अंतीं । तुळें मास तयाचें ॥3॥ कर्ण भिडता समरंगणीं । बाणीं व्यापियेला रणीं । मागसी पाडोनी । तेथें दांत तयाचे ॥4॥ बळी सर्वस्वें उदार । जेणें उभारिला कर । करूनि काहार । तो पाताळीं घातला ॥5॥ िश्रयाळाच्या घरीं । धरणें मांडिलें मुरारी । मारविलें करीं । त्याचें बाळ त्याहातीं ॥6॥ तुज भावें जे भजती । त्यांच्या संसारा हे गति । ठाव नाहीं पुढती। तुका ह्मणे करिसी तें ॥7॥ 134 चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥1॥ तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥ पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥2॥ केलीं मागें नको राहों । तुज जमान आह्मी आहों ॥3॥ करीं तुज जीं करवती । आणिक नामें घेऊं किती ॥4॥ तुका ह्मणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥5॥ 135 बाळ बापा ह्मणे काका । तरी तो कां निपराध ॥1॥ जैसा तैसा भाव गोड । पुरवी कोड विठ्ठल ॥ध्रु.॥ साकरेसि ह्मणतां धोंडा । तरी कां तोंडा न रुचे ॥2॥ तुका ह्मणे आरुष बोल । नव्हे फोल आहाच ॥3॥ 136 चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥1॥ प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥2॥ तुका ह्मणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥3॥ 137 काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥1॥ अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥ काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥2॥ तुका ह्मणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥3॥ 138 शिंदळा साल्याचा नाहीं हा विश्वास । बाइऩल तो त्यास न विसंभे ॥1॥ दुष्ट बुिद्ध चोरी करी निरंतर । तो ह्मणे इतर लोक तैसे ॥2॥ तुका ह्मणे जया चित्तीं जे वासना । तयाची भावना तयापरी ॥3॥ काला चेंडुफळी - अभंग 100 139 झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥1॥ त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥ आगळा होऊनि धरी वरिचिया वरी। चपळ तो जिंके गांढएा ठके येरझारीं ॥2॥ हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥3॥ डाइप पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥4॥ तुका ह्मणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥5॥ 140 अझुनि कां थीर पोरा न ह्मणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥1॥ मोकळा होतासि कां रे पडिलासि डाइप । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥ मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कविळलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥2॥ तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥3॥ सांडितां ठाव पुढें सइऩल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥4॥ तुका ह्मणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥5॥ कोडें - अभंग 2 141 कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥1॥ पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काइऩ ॥ रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आइऩ ॥ध्रु.॥ सांगतों हें मूळ काहीं न धरावी खंती । ज्यालें ज्यवो मेलें मरो प्रारब्धा हातीं ॥2॥ तुका ह्मणे अभिमान सांडावा सकळीं । नये अंगावरी वांयां येऊं देऊं कळी ॥3॥ 142 नुगवे तें उगवून सांगितलें भाइऩ । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाइऩ ॥1॥ आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥ कमाइऩस मोल येथें नका रीस मानू। निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥2॥ तुका ह्मणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥3॥ 143 हारस आनंदाचा । घोष करा हरिनामाचा । कोण हा दैवाचा । भाग पावे येथील ॥1॥ पुण्य पाहिजे बहुत । जन्मांतरींचें संचित । होइऩल करीत । आला अधिकारी तो ॥ध्रु.॥ काय पाहातां हे भाइऩ । हरुषें नाचा धरा घाइऩ । पोटभरी कांहीं । घेतां उरी कांहीं ठेवा ॥2॥ जें सुख दृष्टी आहे । तें च अंतरीं जो लाहे । तुका ह्मणे काय। किळकाळ तें बापुडें ॥3॥ 144 अवघे गोपाळ ह्मणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला । नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥1॥ घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं । ताक सांडी येर येर रे काला भात [[भाकरी]] [[दही]]ं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥ एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा । एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥2॥ एकीं िस्थराविल्या गाइऩ रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती। एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला ह्मणती एक हुंबरी घेती ॥3॥ एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें । गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥4॥ एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें जैसें होतें शिळें संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥5॥ एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा। एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुिद्ध रे केला अवघ्यां वाखा ॥6। तुका ह्मणे आतां कान्होबा आह्मां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आह्मांपाशीं तें तुज अवघें चि ठावें। मोकलितां तुह्मी शरण आह्मी कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥7॥ 145 बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥1॥ पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥ बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥2॥ तुका ह्मणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा वाटों नेदी विषम ॥3॥ 146 आह्मां निकट वासें । कळों आलें जैसें तैसें । नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरीं ॥1॥ पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना । कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ध्रु.॥ खेळ खेळे न पडे डाइप । ज्याचा भार त्याच्या ठायीं । कोणी पडतील डाइप । कोणी कोडीं उगवीती ॥2॥ तुका ह्मणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ । देतो ज्यांचें बळ । त्यांसि तैसा विभाग ॥3॥ 147 काम सारूनि सकळ । आले अवघे गोपाळ । जाली आतां वेळ । ह्मणती आणा सिदो†या ॥1॥ देती आपुलाला झाडा। गाइऩ बैसविल्या वाडां । दोंदिल बोबडा । वांकडएाचा हरि मेळीं ॥ध्रु.॥ आपुलालिये आवडी । मुदा बांधल्या परवडी । निवडूनियां गोडी । हरि मेळवी त्यांत तें ॥2॥ भार वागविला खांदीं । नव्हती मिळाली जों मांदी । सकाळांचे संदी । वोझीं अवघीं उतरलीं ॥3॥ मागे जो तांतडी । त्यासि रागा येती गडी । तुझी कां रे कुडी । येथें मिथ्या भावना ॥4॥ एक एकाच्या संवादें । कैसे धाले ब्रह्मानंदें । तुका ह्मणे पदें । या रे वंदूं हरीचीं ॥5॥ 148 यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदो†या सकळी । काला करूं आजी । अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुह्मामाजी देतों ॥1॥ ह्मणती बरवें गोपाळ । ह्मणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । [[मोहरी]] पांवे आनंदें। खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥ एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे । ह्मणती गोड जालें । ह्मणती गोड जालें ।आणिक देइप । नाहीं पोट धालें ॥2॥ हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया । देऊनियां मिठी। पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥3॥ ह्मणती ठकडा रे कान्हा। लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या । अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर ह्मणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥4॥ एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी। गोळा न साहवे हरि । ह्मणे पुरे आतां । येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । ह्मणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥5॥ आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे । वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥6॥ करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे । एक एकाचें उिच्छष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥7॥ नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी । ह्मणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥8॥ गाइऩ विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार। जालें यमुनेचें िस्थर । जळ वाहों ठेलें । देव पाहाती सकळ। मुखें घोटूनियां लाळ । धन्य ह्मणती गोपाळ । धिग जालों आह्मी॥9॥ ह्मणती कैसें करावें । ह्मणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया । सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजवी ॥10॥ आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । ह्मणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी । ह्मणती जाणे जीवीचें । ह्मणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥11॥ धन्य दिवस काळ। आजी पावला गोपाळ । ह्मणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें । मानवले गडी। एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥12॥ तुझा संग बरवा । नित्य आह्मां द्यावा । ऐसें करूनि जीवा। नित्य देवा चालावें । तंव ह्मणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी। आतां जाऊं खेळीमेळीं । गाइऩ चारावया ॥13॥ तुका ह्मणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाइऩ गोपाळांसि केली। आपण यांसरी । आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आह्मांसहित ॥14॥ 149 या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥1॥ वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥ उरलें तें सांडा काम नका करूं गोवी। हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥2॥ निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाइऩट ॥3॥ कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥4॥ एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका ह्मणे देवें रूपें केल्या तन्मय ॥5॥ फुगडएा - अभंग 2 150 फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे । लाज सांडोनि एक एकी पाहे ॥1॥ फुगडी गे अवघें मोडी गे । तरीच गोडी गे संसार तोडी गे ॥ध्रु.॥ मागें जें शिकली होतीस पोटीं । तें चि विचारूनि आतां उच्चारी ओठीं ॥2॥ त्रिगुणांची वेणी तुझे उडते पाठीं । सावरूनि धरी घाली मूळबंदीं गांठी ॥3॥ आगळें पाउल जिंके एकाएक । पावसी मान हे मानवती तिन्ही लोक ॥4॥ तुका ह्मणे तुजमजमध्यें एक भाव। सम तुकें बार घेऊं पावों उंच ठाव ॥5॥ 151 फुगडी फू सवती माझे तूं । हागुनि भरलें धू तुझ्या ढुंगा तोंडावरि ॥1॥ फुगडी घेतां आली हरी । ऊठ जावो जगनोवरी ॥ध्रु.॥ हातपाय बेंबळ जाती । ढुंगण घोिळतां लागे माती ॥2॥ सात पांच आणिल्या हरी । वांचुनी काय तगसी पोरी ॥3॥ सरला दम पांगले पाय । आझुनि वरी घोिळसी काय ॥4॥ तुका ह्मणे आझुन तरी । सांगितलें तें गधडी करी ॥5॥ ॥2॥ लखोटा - अभंग 1 152 लये लये लखोटा । मूळबंदि कासोटा । भावा केलें साहें । आतां माझें पाहें ॥1॥ हातोहातीं गुंतली । जीवपणा मुकली। धीर माझा निका । सांडीं बोल फिका ॥2॥ अंगीकारी हरि । नको पडों फेरी । लाज धरीं भांडे । जग झोडी रांडे ॥3॥ बैस भावा पाठीं। ऐक माझ्या गोष्टी । केला सांडीं गोहो । येथें धरीं मोहो ॥4॥ पाठमोरा डोल । आवरी तें बोल । पांगलीस बाळा । पुढें अवकळा ॥5॥ आतां उभी ठायीं । उभाउभीं पाहीं । नको होऊं डुकरी । पुढें गाढव कुतरी ॥6॥ नामा केलें खरें । आपुलें म्या बरें। तुका ह्मणे येरी । पांगविल्या पोरी ॥7॥ हुंबरी - अभंग 1 153 तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी ॥ध्रु.॥ सहस्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥1॥ चेंडुवासवें घातली उडी । नाथिला कािळया देऊनि बुडी ॥2॥ अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥3॥ रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडापोरें मारियेलीं ॥4॥ जाणो तो ठावा आहेसि आह्मां । तुवां आपुला मामा मारियेला ॥5॥ याशीं खेळतां नाश थोरू । तुकयास्वामी सारंगधरू ॥6॥ ॥1॥ हमामा - अभंग 2 154 मशीं पोरा घे रे बार । तुझें बुजीन खालील द्वार ॥1॥ पोरा हमामा रे हमामा रे ॥ध्रु.॥ मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥2॥ तरी च मशीं बोल । पोरा जिव्हाऑयाची ओल ॥3॥ मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥4॥ मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥5॥ आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥6॥ तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥7॥ 155 हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर। करी येरझार चौ†याशीची ॥1॥ पहिले पहारा रंगासि आलें । सोहं सोहं सें बार घेतलें । देखोनि गडी तें विसरलें । डाइपऩ पडिलें आपणची ॥ध्रु.॥ दुस†या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें। दिस वाडे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥2॥ तिस†या पहारा घेतला बार । अहंपणे पाय न राहे िस्थर । सोस सोस करितां डाइप पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥3॥ चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय । सु†यापाटिलाचा पोर यम । त्याचे पडलीस डाइप ॥4॥ हमामा घालितां भ्याला तुका त्यानें सांडिली गडएाची सोइऩ । यादवांचा मूल एक विठोबा त्यासवें चारितो गाइऩ ॥5॥ ॥2॥ गाइऩ - अभंग 1 156 आह्मां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥1॥ वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥ वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥2॥ चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥3॥ तुका ह्मणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥4॥ ॥1॥ कांडण - अभंग 2 157 सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुिद्ध गे ॥1॥ आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥ सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमिळणी जंव मिळें ॥2॥ एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥3॥ सरलें कांडण पाकसििद्ध करी । मेळवण िक्षरीसाकरेचें ॥4॥ उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥5॥ तुका ह्मणे मज माहेरीं आवडी । ह्मणोनि तांतडी मूळ केलें ॥6॥ 158 सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥1॥ मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थिरीं घाव घालीं ॥ध्रु.॥ वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥2॥ कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥3॥ तुका ह्मणे रूप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध जाला ॥4॥ ॥2॥ आडसण दळण - अभंग 1 159 शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥1॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सिद्ध कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥ सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥2॥ सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दिळल्या जेवण जैसें तैसें ॥3॥ सुपीं तों चि संग घेइप धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥4॥ दिळतां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥5॥ सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका ह्मणे ॥6॥ ॥1॥ दळण - अभंग 1 160 शुद्ध दळणाचें सुख सांगों काइऩ । मानवित सइऩबाइऩ तुज ॥1॥ शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥ शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥2॥ शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥3॥ तुका ह्मणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥4॥ ॥1॥ 161 उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥1॥ वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥ एकमेकां देऊं मुखीं । सुखीं घालूं हुंबरी ॥2॥ तुका ह्मणे वाळवंट । बरवें नीट उत्तम ॥3॥ 162 याल तर या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥1॥ आजि देतों पोटभरी । पुरे ह्मणाल तोंवरी ॥ध्रु.॥ हळू हळू चला । कोणी कोणाशीं न बोला ॥2॥ तुका ह्मणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥3॥ 163 शिंकें लावियेलें दुरी । होतों तिघांचे मी वरी ॥1॥ तुह्मी व्हारे दोहींकडे । मुख पसरूनि गडे ॥ध्रु.॥ वाहाती त्या धारा। घ्यारे दोहींच्या कोंपरा ॥2॥ तुका ह्मणे हातीं टोका । अधिक उणें नेदी एका ॥3॥ 164 पळाले ते भ्याड । त्यांसि येथें जाला नाड ॥1॥ धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥ आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥2॥ तुका लागे घ्यारे पायां । कैं पावाल या ठाया ॥3॥ 165 धालें मग पोट । केला गडएांनी बोभाट ॥1॥ ये रे ये रे नारायणा । बोलों अबोलण्या खुणा ॥ध्रु.॥ खांद्यावरी भार । तीं शिणती बहु फार ॥2॥ तुकयाच्या दातारें । नेलीं सुखी केलीं पोरें ॥3॥ 166 पाहाती गौळणी । तंव पालथी दुधाणी ॥1॥ ह्मणती नंदाचिया पोरें । आजि चोरी केली खरें ॥ध्रु.॥ त्याविण हे नासी नव्हे दुसरिया ऐसी ॥2॥ सवें तुका मेळा । त्याणें अगुणा आणिला ॥3॥ 167 आतां ऐसें करूं । दोघां धरूनियां मारूं ॥1॥ मग टाकिती हे खोडी । तोंडीं लागली ते गोडी ॥ध्रु.॥ कोंडूं घरामधीं । न बोलोनि जागों बुद्धी ॥2॥ बोलावितो देवा । तुका गडियांचा मेळावा ॥3॥ 168 गडी गेले रडी । कान्हो नेदीस तूं चढी ॥1॥ आह्मी न खेळों न खेळों । आला भाव तुझा कळों ॥ध्रु.॥ न साहावे भार। बहु लागतो उशीर ॥2॥ तुका आला रागें । येऊं नेदी मागें मागें ॥3॥ हाल - अभंग 2 169 यमुनेतटीं मांडिला खेळ । ह्मणे गोपाळ गडियांसि ॥1॥ हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥ नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥2॥ तुका ह्मणे कान्हो तिळतांदऑया । जिंके तो करी आपुला खेऑया ॥3॥ 170 बळें डाइप न पडे हरी । बुिद्ध करी शाहणा तो ॥1॥ मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥ येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥2॥ तुका ह्मणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥3॥ ॥2॥ सुतुतू - अभंग 1 171 जीवशिवाच्या मांडूनि हाला । अहं सोहं दोन्ही भेडती भला ॥1॥ घाली सुतुतू फिरोनि पाही आपुणासि । पाही बिळया तो मागिला तुटी पुढिलासि ॥ध्रु.॥ खेिळया तो हाल सांभाळी । धुम घाली तो पडे पाताळीं ॥2॥ बिळया गांढएा तो चि खेळे । दम पुरे तो वेळोवेळां खेळे ॥3॥ हातीं पडे तो चि ढांग । दम पुरे तो खेिळया चांग ॥4॥ मागें पुढें पाहे तो जिंके । हातीं पडे तो चि आधार फिके ॥5॥ आपल्या बळें खळे रे भाइऩ । गडियाची सांडोनि सोइऩ ॥6॥ तुका ह्मणे मी खेिळया नव्हें । जिकडे पडें त्याचि सवें ॥7॥ ॥1॥ 172 अनंत ब्रह्मांडे उदरीं । हरि हा बाळक नंदा घरीं ॥1॥ नवल केव्हडें केव्हडें । न कळे कान्होबाचें कोडें ॥ध्रु.॥ पृथ्वी जेणें तृप्त केली । त्यासि यशोदा भोजन घाली ॥2॥ विश्वव्यापक कमळापती। त्यासि गौळणी कडिये घेती ॥3॥ तुका ह्मणे नटधारी। भोग भोगून ब्रह्मचारी ॥4॥ 173 कृष्ण गोकुळीं जन्मला । दुष्टां चळकांप सुटला ॥1॥ होतां कृष्णाचा अवतार । आनंद करिती घरोघर ॥ध्रु.॥ प्रेम नाम वाचें गाती । सदा आनंदें नाचती ॥2॥ तुका ह्मणे हरती दोष । आनंदानें करिती घोष ॥3॥ 174 मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥1॥ चला जाऊं चोरूं [[लोणी]] । आजि घेऊं चंद्रधणी । वेळ लावियेला अझुणी। एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥ वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥2॥ अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥3॥ घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥4॥ रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥5॥ बोलों नेदी ह्मणे स्थीर । खुणा दावी खा रे क्षीर ॥6॥ 175 धन्य त्या गौळणी इंद्राच्या पूजनीं । नैवेद्य हिरोनि खातो कृष्ण ॥1॥ अरे कृष्णा इंद्र अमर इिच्छती । कोण तयांप्रति येइल आतां ॥2॥ तुका ह्मणे देव दाखवी विंदान । नैवेद्य खाऊन हासों लागे ॥3॥ 176 तुह्मी गोपी बाळा मज कैशा नेणा । इंद्र अमरराणा म्यां चि केला ॥1॥ इंद्र चंद्र सूर्य ब्रह्मा तिन्ही लोक । माझे सकळीक यम धर्म ॥ध्रु.॥ मजपासूनिया जाले जीव शिव । देवांचा ही देव मी च कृष्ण ॥2॥ तुका ह्मणे त्यांसी बोले नारायण । व्यर्थ मी पाषाण जन्मा आलों ॥3॥ 177 कां रे गमाविल्या गाइऩ । आली वळती तुझी जाइऩ । मागें जालें काइऩ । एका तें का नेणसी ॥1॥ केलास फजित । मागें पुढें ही बहुत । लाज नाहीं नित्य । नित्य दंड पावतां ॥ध्रु.॥ वोला खोडा खिळ गाढी । ऐसा कोण तये काढी । धांवेल का पाडी । तुझी आधीं वोढाळा ॥2॥ चाल धांवें । मी ही येतों तुजसवें । तुका ह्मणे जंव । तेथें नाहीं पावली ॥3॥ 178 काय या संतांचे मानूं उपकार । मज निरंतर जागविती ॥1॥ काय देवा यांसि व्हावें उतराइऩ । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥ सहज बोलणें हित उपदेश । करूनि सायास शिकविती ॥2॥ तुका ह्मणे वत्स धेनुचिया चित्तीं । तैसें मज येती सांभािळत ॥3॥ 179 कंठीं धरिला कृष्णमणी । अवघा जनीं प्रकाश ॥1॥ काला वांटूं एकमेकां । वैष्णवा निका संभ्रम ॥ध्रु.॥ वांकुलिया ब्रह्मादिकां । उत्तम लोकां दाखवूं ॥2॥ तुका ह्मणे भूमंडळीं । आह्मी बळी वीर गाडे ॥3॥ 180 कवळाचिया सुखें । परब्रह्म जालें गोरखें । हात गोऊनि खाय मुखें । बोटासांदी [[लोणचे]]ं ॥1॥ कोण जाणे तेथें । कोण लाभ कां तें । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ घाली हमामा हुंबरी । पांवा वाजवी छंदें मोहरी । गोपाळांचे फेरी । हरि छंदें नाचतसे ॥2॥ काय नव्हतें त्या घरीं खावया । रिघे लोणी चोरावया । तुका ह्मणे सवें तया । आह्मी ही सोंकलों ॥3॥ 181 कान्होबा आतां तुह्मी आह्मी च गडे । कोणाकडे जाऊं नेदूं ॥1॥ वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदीं ॥ध्रु.॥ ढवळे गाइऩचें दूध काढूं । एकएकल्यां ठोंबे मारूं ॥2॥ तुका ह्मणे टोकवूं त्यांला । जे तुझ्या बोला मानीत ना ॥3॥ 182 बहु काळीं बहु काळी । आह्मी देवाचीं गोवळीं ॥1॥ नाहीं विटों देत भात । जेऊं बेसवी सांगातें ॥ध्रु.॥ बहु काळें बहु काळें । माझें पांघरे कांबळें ॥2॥ तुका ह्मणे नाहीं नाहीं । त्याचें आमचें सें कांहीं ॥3॥ 183 बहु बरा बहु बरा । यासांगातें मिळे चारा ॥1॥ ह्मणोनि जीवेंसाठीं । घेतली कान्होबाची पाठी ॥ध्रु.॥ बरवा बरवा दिसे । समागम याचा निमिषें ॥2॥ पुढती पुढती तुका । सोंकला सोंकवितो लोकां ॥3॥ 184 घेती पाण्यासी हुंबरी । त्यांचें समाधान करी ॥1॥ ऐशी गोपाळांची सवे । जाती तिकडे मागें धांवे ॥ध्रु.॥ िस्थरावली गंगा । पांगविली ह्मणे उगा ॥2॥ मोहरी पांवा काठी । तुका ह्मणे यांजसाठी ॥3॥ 185 वळी गाइऩ धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥1॥ नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥ नेदी पडों उणें पुरें। ह्मणे अवघें चि बरें ॥2॥ तुका ह्मणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥3॥ 186 ह्मणती धालों धणीवरी । आतां न लगे शिदोरी । नये क्षणभरी । आतां यासि विसंबों ॥1॥ चाल चाल रे कान्होबा खेळ मांडूं रानीं । बैसवूं गोठणीं गाइऩ जमा करूनि ॥ध्रु.॥ न लगे जावें घरा। चुकलिया येरझारा । सज्जन सोयरा । मायबाप तूं आह्मां ॥2॥ तुका ह्मणे धालें पोट । आतां कशाचा बोभाट । पाहाणें ते वाट । मागें पुढें राहिली ॥3॥ 187 तुझिये संगति । जाली आमुची नििंश्चति ॥1॥ नाहीं देखिलें तें मिळे । भोग सुखाचे सोहळे ॥ध्रु.॥ घरीं ताकाचें सरोवर। येथें नवनीताचे पूर ॥2॥ तुका ह्मणे आतां । आह्मी न वजों दवडितां ॥3॥ 188 कामें पीडिलों माया । बहु मारी नाहीं दया ॥1॥ तुझ्या राहिलों आधारें । जालें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ तुझे लागलों संगती। आतां येतों काकुळती ॥2॥ तुका ह्मणे तुझ्या भिडा । कान्होबा हे गेली पीडा ॥3॥ टिपरी - अभंग 7 189 खेळ मांडियेला वाळवंटीं घाइप । नाचती वैष्णव भाइऩ रे। क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ॥1॥ नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी । किळकाळावरि घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ॥ध्रु.॥ गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा । हार मिरवती गळां । टाळ मृदंग घाइऩ पुष्पवरुषाव। अनुपम्य सुखसोंहळा रे ॥2॥ लुब्धलीं नादीं लागली समाधी । मूढ जन नर नारी लोकां । पंडित Yाानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ॥3॥ वर्णाभिमान विसरली याति । एकएकां लोटांगणीं जाती । निर्मळ चित्तें जालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ॥4॥ होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे । तुका ह्मणे सोपी केली पायवाट । उतरावया भवसागर रे ॥5॥ 190 एके घाइप खेळतां न पडसी डाइप । दुचाऑयाने ठकसील भाइऩ रे । त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चौघांसी तरी धरीं सोइऩ रे ॥1॥ खेळ खेळोनियां निराळा चि राही । सांडी या विषयाची घाइऩ रे । तेणें चि खेळें बसवंत होसी । ऐसें सत्य जाणें माझ्या भाइऩ रे ॥ध्रु.॥ सिंपियाचा पोर एक खेिळया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे । आपुल्या सवंगडिया सिकवूनि घाइप । तेणें सतंतर फड जागविला रे । एक घाइप खेळतां तो न चुके चि कोठें । तया संत जन मानवले रे ॥2॥ Yाानदेव मुHाबाइऩ वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे । कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला आपण भोंवतीं नाचती रे । सकिळकां मिळोनि एकी च घाइप । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायीं रे ॥3॥ रामा बसवंत कबिर खेिळया । जोडा बरवा मिळाला रे । पांचा सवंगडियां एक चि घाइऩ तेथें नाद बरवा उमटला रे । ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनीं । तो ही खेळ निवडिला रे ॥4॥ ब्राह्मणाचा पोर खेिळया एक भला तेणें जन खेळकर केला रे । जनादऩन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मिळविला रे । एक चि घाइप खेळतां खेळतो । आपण चि बसवंत जाला रे ॥5॥ आणीक खेिळये होउनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे । तुका ह्मणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सोइऩ रे । एक चि घाइप खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाइप रे ॥6॥ 191 बाराही सोळा गडियांचा मेळा । सतरावा बसवंत खेिळया रे । जतिस पद राखों जेणें टिपरिया घाइप । अनुहातें वायें मांदळा रे ॥1॥ नाचत पंढरिये जाऊं रे खेिळया । विठ्ठल रखुमाइऩ पाहूं रे ॥ध्रु.॥ सा चहूं वेगळा अठराही निराळा । गाऊं वाजवूं एक चाळा रे । विसरती पक्षी चारा घेणें पाणी । तारुण्य देहभाव बाळा रे ॥2॥ आनंद तेथिचा मुकियासि वाचा । बहिरे ऐकती कानीं रे । आंधऑयांसि डोळे पांगळांसि पाय । तुका ह्मणे वृद्ध होती तारुण्यें रे ॥3॥ 192 दोन्ही टिपरीं एक चि नाद । सगुण निर्गुण नाहीं भेद रे । कुसरी अंगें मोडितील परी । मेळविति एका छंदें रे ॥1॥ कांहीं च न वजे वांयां रे । खेिळया एक चि बसवंत अवघियां रे । सम विषम तेथें होऊं च नेदी । जाणऊनि आगिळया रे ॥ध्रु.॥ संत महंत सिद्ध खेळतील घाइप । ते च सांभाळी माझ्या भाइऩ रे । हात राखोन हाणिती टिप†या । टिपरें मिळोनि जाय त्याची सोइऩ रे ॥2॥ विताळाचें अवघें जाइऩल वांयां । काय ते शृंगारूनि काया रे । निवडूनि बाहेर काढिती निराळा । जो न मिळे संताचिया घाइऩ रे ॥3॥ प्रकाराचें काज नाहीं सोडीं लाज । निःशंक होउनियां खेळें रे। नेणतीं नेणतीं च एकें पावलीं मान । विठ्ठल नामाचिया बळें रे ॥4॥ रोमांच गुढिया डोलविती अंगें । भावबळें खेळविती सोंगें रे। तुका ह्मणे कंठ सद्गदित दाटे । या विठोबाच्या अंगसंगें रे ॥5॥ 193 या रे गडे हो धरूं घाइऩ जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं आपुलिया हिता ॥1॥ फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि सोनियाचा दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥ हिंडती रानोरान भुजंगांत कांटएावन । सुख तयांहून आह्मां गातां नाचतां रे ॥2॥ तुका ह्मणे ब्रह्मादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥3॥ 194 भीमातीरीं एक वसलें नगर । त्याचें नांव पंढरपुर रे । तेथील मोकासी चार भुजा त्यासी । बाइला सोळा हजार रे ॥1॥ नाचत जाऊं त्याच्या गांवा रे खेिळया । सुख देइऩल विसावा रे । पुढें गेले ते निधाइऩ जाले । वाणितील त्याची सीमा रे ॥ध्रु.॥ बिळयां आगळा पाळी लोकपाळां । रीघ नाहीं किळकाळा रे । पुंडलीक पाटील केली कुळवाडी । तो जाला भवदुःखा वेगळा रे ॥2॥ संतसज्जनीं मांडिलीं दुकाने । जया जें पाहिजे तें आहे रे । भुिHमुिH फुका च साठीं । कोणी तयाकडे न पाहे रे ॥3॥ दोन्ही च हाट भरले घनदाट । अपार मिळाले वारकरी रे । न वजों ह्मणती आह्मी वैकुंठा । जिहीं देखिली पंढरी रे ॥4॥ बहुत दिस होती मज आस। आजि घडलें सायासीं रे । तुका ह्मणे होय तुमचेनी पुण्यें । भेटी तया पायांसी रे ॥5॥ 195 पंढरी चोहटा मांडियेला खेळ । वैष्णव मिळोनि सकळ रे । टाळ टिपरी मांदळे एक नाद रे । जाला बसवंत देवकीचा बाळ रे ॥1॥ चला तें कवतुक भाइऩ रे । पाहों डोळां कामीं गुंतलेति काइऩ रे । भाग्यवंत कोणी गेले सांगाति । ऐसें सुख त्रिभुवनीं नाहीं रे ॥ध्रु.॥ आनंदाचे वाद सुखाचे संवाद । एक एका दाखविती छंद रे। साही अठरा चारी घालुनियां घाइप । नाचती फेरी टाळशुद्ध रे ॥2॥ भHाचीं भूषणें मुद्रा आभरणें । शोभती चंदनाच्या उटएा रे । सत्व सुंदर कास घालूनि कुसरी । गर्जती नाम बोभाटीं रे ॥3॥ हरि हर ब्रह्मा तीर्थासहित भीमा । देव कोटी तेहतीस रे । वििस्मत होऊनि ठाकले सकळ जन । अमरावती केली ओस रे ॥4॥ वाणितील थोरी वैकुंठिचीं परी । न पवे पंढरीची सरी रे । तुकयाचा दास ह्मणे नका आळस करूं । सांगतों नरनारींस रे ॥5॥ ॥7॥ 196 ब्रह्मादिकां न कळे खोळ । ते हे आकळ धरिली ॥1॥ मोहरी पांवा वाहे काठी । धांवे पाठीं गाइऩचे ॥ध्रु.॥ उिच्छष्ट न लभे देवा । तें हें सदैवां गोवऑयां ॥2॥ तुका ह्मणे जोड जाली । ते हे माउली आमुची ॥3॥ 197 कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाइऩट । बोलोनियां खोटें ॥1॥ परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आह्मांसी ॥ध्रु.॥ तूं ठायींचा गोवळ । अविचारी अनर्गळ । चोरटा शिंदळ । ऐसा पिटूं डांगोरा ॥2॥ जरी तुझी आइऩ । आह्मी घालूं सर्वा ठायीं । तुका ह्मणे तें ही । तुज वाटे भूषण ॥3॥ 198 भोजनाच्या काळीं । कान्हो मांडियेली आळी । काला करी वनमाळी अन्न एकवटा । देइप निवडुनी । माते ह्मणतो जननी। हात पिटूनि मेदिनी । वरि अंग घाली ॥1॥ कैसा आळ घेसी । नव्हे तें चि करविसी । घेइप दुसरें तयेसी । वारी ह्मणे नको ॥ध्रु.॥ आतां काय करूं । नये यासि हाणूं मारूं । नव्हे बुझावितां िस्थरू कांहीं करिना हा । तोंचिं केलें एके ठायीं । आतां निवडूनि खाइप । आह्मा जाचितोसि काइऩ । हरिसि ह्मणे माता ॥2॥ त्याचें तयाकुन । करवितां तुटे भान । तंव जालें समाधान उठोनियां बैसे। माते बरें जाणविलें। अंग चोरूनि आपुलें । तोडियलें एका बोलें । कैसें सुखदुःख ॥3॥ ताट पालवें झाकिलें होतें तैसें तेथें केलें । भिन्नाभिन्न निवडिलें । अन्नें वेगळालीं । वििस्मत जननी । भाव देखोनियां मनीं । ह्मणे नाहीं ऐसा कोणी । तुज सारिखा रे ॥4॥ हरुषली माये । सुख अंगीं न समाये । कवळूनि बाहे । देती आलिंगन। आनंद भोजनीं । तेथें फिटलीसे धणी । तुका ह्मणे कोणी। सांडा शेष मज ॥5॥ 199 चला वळूं गाइऩ । बैसों जेऊं एके ठायीं ॥1॥ बहु केली वणवण । पायपिटी जाला सिण ॥ध्रु.॥ खांदीं भार पोटीं भुक । काय खेळायाचें सुख ॥2॥ तुका ह्मणे धांवे । मग अवघें बरवें ॥3॥ 200 नेणों वेळा काळ । धालों तुझ्यानें सकळ ॥1॥ नाहीं नाहीं रे कान्होबा भय आह्मापाशीं । वळूनि पुरविसी गाइऩ पोटा खावया ॥ध्रु.॥ तुजपाशीं भये । हें तों बोलों परी नये ॥2॥ तुका ह्मणे बोल । आह्मा अनुभवें फोल ॥3॥ विटूदांडू - अभंग 1 201 माग विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥1॥ बहु अंगा आले डाव । िस्थर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥ कोली हाणे टोला। झेली तेणें तो गोविला ॥2॥ एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥3॥ राजी आलें नांव । फेरा न चुके चि धांव ॥4॥ पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥5॥ एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥6॥ तुका ह्मणे आतां । खेळ मोडावा परता ॥7॥ ॥1॥ 202 पाहातां गोवळी । खाय त्यांची उष्टावळी ॥1॥ करिती नामाचें चिंतन । गडी कान्होबाचें ध्यान ॥ध्रु.॥ आली द्यावी डाइऩ । धांवे वळत्या मागें गाइऩ ॥2॥ एके ठायीं काला । तुका ह्मणे भाविकाला ॥3॥ 203 पैल आली आगी कान्हो काय रे करावें । न कळे तें कैसें आजि वांचों आह्मी जीवें ॥1॥ धांव रे हरी सांपडलों संधी । वोणव्याचे मधीं बुिद्ध कांहीं करावी ॥ध्रु.॥ अवचितां जाळ येतां देखियेला वरी । परतोनि पाहतां आधीं होतों पाठमोरी ॥2॥ सभोंवता फेर रीग न पुरे पळतां । तुका ह्मणे जाणसी तें करावें अनंता ॥3॥ 204 भिऊं नका बोले झाकुनियां राहा डोळे । चालवील देव धाक नाहीं येणें वेळे ॥1॥ बाप रे हा देवांचा ही देव कळों । नेदी माव काय करी करवी ते ॥ध्रु.॥ पसरूनि मुख विश्वरूप खाय जाळ। सारूनियां संधी अवघे पाहाती गोपाळ ॥2॥ तुका ह्मणे आह्मी मागें भ्यालों वांयांविण । कळों आलें आतां या सांगातें नाहीं शिण ॥3॥ 205 नेणती तयांसि साच भाव दावी हरी । लाज नाहीं नाचे पांवा वाजवी मोहरी ॥1॥ चला रे याच्या पायां लागों आतां । राखिलें जळतां महा आगीपासूनि ॥ध्रु.॥ कैसी रे कान्होबा एवढी गििळयेली आगी । न देखों पोळला तुज तोंडीं कोठें अंगी ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी कां रे करितां नवल । आमची सिदोरी खातो त्याचें आलें बळ ॥3॥ 206 त्यांनीं धणीवरी संग केला हरीसवें । देऊनि आपुलें तो चि देइऩल तें खावें ॥1॥ न ठेवी आभार प्रेमाचा भुकेला । बहु दिवस संग हा चि निर्धार त्याला ॥ध्रु.॥ कान्होबा तू जेवीं घासोघासीं ह्मणती। आरुष गोपाळें त्यांची बहु देवा प्रीती ॥2॥ तुका ह्मणे आतां जाऊं आपुलिया घरा । तोय वांचविलें ऐसें सांगों रे दातारा ॥3॥ 207 घ्या रे भोंकरें भाकरी । दहींभाताची सिदोरी । ताक सांडीं दुरी । असेल तें तयापें ॥1॥ येथें द्यावें तैसें घ्यावे । थोडें परी निरें व्हावें । सांगतों हे ठावें । असों द्या रे सकळां ॥ध्रु.॥ माझें आहे तैसें पाहे । नाहीं तरी घरा जाये । चोरोनियां माये । नवनीत आणावें ॥2॥ तुका ह्मणे घरीं । माझें कोणी नाहीं हरी । नका करूं दुरी । मज पायां वेगळें ॥3॥ 208 काल्याचिये आसे । देव जळीं जाले मासे । पुसोनियां हांसे टिरीसांगातें हात ॥1॥ लाजे त्यासि वांटा नाहीं । जाणे अंतरीचें तें ही । दीन होतां कांहीं । होऊं नेदी वेगळें ॥ध्रु.॥ उपाय अपाय यापुढें । खोटे निवडितां कुडे । जोडुनियां पुढें । हात उभे नुपेक्षी ॥2॥ तें घ्या रे सावकाशें । जया फावेल तो तैसें । तुका ह्मणे रसें । प्रेमाचिया आनंदें ॥3॥ 209 गोपाळ ह्मणती कान्होबा या रे कांहीं मागों । आपुलाले आह्मी जीवीची तया आवडी सांगों । एक ह्मणती उगे रे उगे मागें चि लागों । निजों नका कोणी घरीं रे आजि अवघे चि जागों ॥1॥ जाणोनि नेणता हरि रे मध्यें उगाचि बैसे । नाइकोनि बोल अइके कोण कोणाचे कैसे । एक एकाच्या संवादा जाणे न मिळे ची ऐसें। पोटीचें होटा आणवी देतो तयांसि तैसें ॥ध्रु.॥ एक ह्मणति बहु रे आह्मी पीडिलों माया । नेदी दहींभातसिदोरी ताक घालिती पिया । तापलों विळतां गोधनें नाहीं जीवन छाया । आतां मागों पोटभरी रे याच्या लागोनि पायां ॥2॥ एक ह्मणति तुमचें अरे पोट तें किती। मागों गाइऩ ह्मैसी घोडे रे धन संपित्त हित्त । देव गडी कान्हो आमुचा आह्मां काय हातिं । कन्याकुमरें दासी रे बाजावरी सुपती ॥3॥ एक ह्मणती बेटे हो कोण करी जतन । गाढव तैसें चि घोडें रे कोण तयाचा मान । लागे भवरोग वाहतां खांदीं चवघे जण । हातीं काठएा डोया बोडक्या हिंडों मोकळे राण ॥4॥ एक ह्मणती रानीं रे बहु सावजें फार । फाडफाडूं खाती डोळे रे पाय नेतील कर । राखोनि राखे आपणा ऐसा कइचा शूर । बैसोनि राहों घरीं रे कोण करी हे चार ॥5॥ घरीं बैसलिया बहुतें बहु सांगती काम । रिकामें कोणासि नावडे ऐसें आह्मासि ठावें । चौघांमध्यें बरें दिसेसें तेथें नेमक व्हावें। लपोनि सहज खेळतां भलें गडियासवें ॥6॥ एक ह्मणती गडी ते भले मिळती मता । केली तयावरी चाली रे बरी आपुली सत्ता । नसावे ते तेथें तैसे रे खेळ हाणिती लाता । रडी एकाएकीं गेलिया गोंधळ उडती लाता ॥7॥ एक ह्मणती खेळतां उगीं राहतीं पोरें । ऐसें काय घडों शके रे कोणी लहान थोरें । अवघीं येती रागा रे एका ह्मणतां बरें । संगें वाढे कलह हरावा एकाएकीं च खरें ॥8॥ एक ह्मणती एकला रे तूं जासील कोठें । सांडी मांडी हें वाउगें तुझे बोल चि खोटे । ठायीं राहा उगे ठायीं च कां रे सिणसी वाटे । अवघियांची सिदोरी तुझे भरली मोटे ॥9॥ तुका ह्मणे काय काहण्या अरे सांगाल गोष्टी । चाटावे तुमचे बोल रे भुका लागल्या पोटीं । जागा करूं या रे कान्होबा मागों कवळ ताटीं । धाले गडी तुका ढेकर देतो विठ्ठल कंठीं ॥10॥ 210 आजि ओस अमरावती । काला पाहावया येती । देव विसरती । देहभाव आपुला ॥1॥ आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी । तटस्थ त्या ध्यानीं । गाइऩ जाल्या श्वापदें ॥ध्रु.॥ जें या देवांचें दैवत । उभें आहे या रंगांत । गोपाळांसहित । क्रीडा करी कान्होबा ॥2॥ 211 चला बाइऩ पांडुरंग पाहूं वाळवंटीं । मांडियेला काला भोंवती गोपाळांची दाटी ॥1॥ आनंदें कवळ देती एकामुखीं एक । न ह्मणती सान थोर अवघीं सकिळक ॥ध्रु.॥ हमामा हुंबरी पांवा वाजविती मोहरी । घेतलासे फेर माजी घालुनियां हरी ॥2॥ लुब्धल्या नारी नर अवघ्या पशुयाती । विसरलीं देहभाव शंका नाहीं चित्तीं ॥3॥ पुष्पाचा वरुषाव जाली आरतियांची दाटी । तुळसी गुंफोनियां माळा घालितील कंठीं ॥4॥ यादवांचा राणा गोपीमनोहर कान्हा । तुका ह्मणे सुख वाटे देखोनियां मना ॥5॥ 212 माझे गडी कोण कोण । निवडा भिन्न यांतुनी ॥1॥ आपआपणामध्यें मिळों । एक खेळों एकाशीं ॥ध्रु.॥ घाबरियांच्या मोडा काडएा । धाडा भाडएां वळतियां ॥2॥ तुका ह्मणे देवापाशीं। विटाळशी नसावी ॥3॥ 213 हे चि अनुवाद सदा सर्वकाळ । करुनियां गोपाळकाला सेवूं ॥1॥ वोरसलें कामधेनूचें दुभतें । संपूर्ण आइतें गगनभरी ॥ध्रु.॥ संत सनकादिक गोमटएा परवडी । विभाग आवडी इच्छेचिये ॥2॥ तुका ह्मणे मधीं घालूं नारायण । मग नव्हे सीण कोणा खेळें ॥3॥ 214 अधिकाचा मज कांटाळा । तुह्मां गोपाळां संगति ॥1॥ काय नाहीं तुह्मापाशीं । सकळांविशीं संपन्न ॥ध्रु.॥ उद्योगाचा नेघें भार। लागल्या सार पुरतें ॥2॥ तुका ह्मणे अधीर जिणें । नारायणें न करावें ॥3॥ 215 जालों आतां एके ठायीं । न वंचूं कांहीं एकमेकां ॥1॥ सरलों हेंगे देउनि मोट । कटकट काशाची ॥ध्रु.॥ सोडोनियां गांठीं पाहें । काय आहे त्यांत तें ॥2॥ तुका ह्मणे जालों निराळा । आतां गोपाळा देऊं बोभा ॥3॥ 216 या रे करूं गाइऩ । जमा निजलेती काइऩ । बोभाटानें आइऩ । घरा गेल्या मारील ॥1॥ घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥ नेणोनियां खेळा। समय समयाच्या वेळा । दुिश्चताजवळा । मिळालेति दुिश्चत ॥2॥ तुका ह्मणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥3॥ 217 वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥1॥ घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीनें वाढावें ॥ध्रु.॥ सांगितलें केलें काम। नव्हे धर्म सत्याचा ॥2॥ तुका ह्मणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें॥3॥ 218 येइल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥1॥ आवडी ते तुह्मी जाणा । बहु गुणांसारिखी ॥ध्रु.॥ मज घेती डांगवरी। सवें हरि नसलिया ॥2॥ तुका ह्मणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥3॥ 219 अंतरली कुटी मेटी । भय धरूनियां पोटीं । ह्मणतां जगजेठी । धांवें करुणाउत्तरीं ॥1॥ बाप बिळया शिरोमणी । उताविळ या वचनीं । पडलिया कानीं । धांवा न करी आळस ॥ध्रु.॥ बळ दुनी शरणागता । स्वामी वाहों नेदी चिंता । आइतें चि दाता । पंगतीस बैसवी ॥2॥ वाहे खांदीं पाववी घरा । त्याच्या करी येरझारा। बोबडएा उत्तरा । स्वामी तुकया मानवे ॥3॥ 220 धन्य तें गोधन कांबळी कािष्ठका । मोहरी पांवा निका ब्रीद वांकी ॥1॥ धन्य तें गोकुळ धन्य ते गोपाळ । नर नारी सकळ धन्य जाल्या ॥ध्रु.॥ धन्य देवकी जसवंती दोहींचें । वसुदेवनंदाचें भाग्य जालें ॥2॥ धन्य त्या गोपिका सोळा सहस्र बाळा । यादवां सकळां धन्य जालें ॥3॥ धन्य ह्मणे तुका जन्मा तीं चि आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥4॥ 221 गौळणी बांधिती धारणासि गळा । खेळे त्या गोपाळांमाजी ब्रह्म ॥1॥ धांवोनियां मागे यशोदे भोजन । हिंडे रानोरान गाइऩपाठीं ॥ध्रु.॥ तुका ह्मणे सर्व कळा ज्याचे अंगीं । भोळेपणालागीं भीक मागे ॥2॥ 222 देखिलासि माती खातां । दावियानें बांधी माता ॥1॥ जाळी घेउनि कांबळी काठी । गाइऩ वळी वेणु पाठीं ॥ध्रु.॥ मोठें भावार्थाचें बळ । देव जाला त्याचें बाळ ॥2॥ तुका ह्मणे भHासाठीं। देव धांवे पाठोवाटीं ॥3॥ 223 हा गे माझे हातीं । पाहा कवळ सांगाती ॥1॥ देवें दिला खातों भाग । कराल तर करा लाग ॥ध्रु.॥ धालें ऐसें पोट । वरी करूनियां बोट ॥2॥ तुका ह्मणे घरीं । मग कैं जी या परी ॥3॥ 224 अवघें अवघीकडे । दिलें पाहे मजकडे । अशा सवंगडे। सहित थोरी लागली ॥1॥ कां रे धरिला अबोला । माझा वांटा देइप मला । सिदोरीचा केला । झाडा आतां निवडे ना ॥ध्रु.॥ भूक लागली अनंता । कां रे नेणसी जाणतां । भागलों विळतां । गाइऩ सैरा ओढाळा ॥2॥ तुका करुणा भाकी । हरि पाहे गोळा टाकी । घेता जाला सुखी। भीतरी वांटी आणीकां ॥3॥ 225 आह्मी गोवळीं रानटें । नव्हों जनांतील धीटें ॥1॥ सिदोरीचा करूं काला । एक वांटितों एकाला ॥ध्रु.॥ खेळों आपआपणांशीं। आमचीं तीं आह्मांपाशीं ॥2॥ मिळालों नेणते । तुका कान्होबा भोंवते ॥3॥ 226 अवघियां दिला गोर । मजकरे पाहीना ॥1॥ काुंफ्दे गोपाळ डोळे चोळी । ढुंगा थापली हाणे तोंडा ॥ध्रु.॥ आवडती थोर मोटे । मी रे पोरटें दैन्यवाणे ॥2॥ तुका ह्मणे जाणों भाव । जीविंचा देव बुझावी ॥3॥ मृदंग पाटएा - अभंग 227 मागें पुढें पाहें सांभाळूनि दोनी ठाय । चुकावूनि जाय गडी राखे गडियांसि ॥1॥ मुरडे दंडा दोहीं तोंडें गडियां सावध करी । भेटतियासंगे तया हाल तुजवरी ॥ध्रु.॥ गडियां गडी वांटुनि देइप । ज्याचा सोडी ते चि ठायीं ॥2॥ अगऑया बळें करील काय। तुज देणें लागे डोय ॥3॥ नवां घरीं पाउला करीं । सांपडे तो तेथें धरीं ॥4॥ जिंकोनि डाव करीं । टाहो सत्ता आणिकांवरी ॥5॥ सांपडोनि डाइप बहु । काळ गुंतलासी ॥6॥ बिळया गडी फळी । फोडी न धरितां त्यांसी ॥7॥ चुकांडी जो खाय मिळोनि अंगीं जाय। गुंतलासी काय तुका ह्मणे अझूनी ॥8॥ 228 पाहा रे तमासा तुमचा येथें नव्हे लाग । देइऩन तो भाग आलियाचा बाहेरी ॥1॥ जागा रे गोपाळ नो ठायीं ठायीं जागा । चाहुलीनें भागा दूर मजपासूनि ॥ध्रु.॥ न रिघतां ठाव आह्मा ठावा पाळतियां । भयाभीत वांयां तेथें काय चांचपा ॥2॥ तुका ह्मणे हातां चडे जीवाचिये साटीं । मिटक्या देतां गोड मग लागतें शेवटीं ॥3॥ 229 डाइऩ घालुनियां पोरें । त्यांचीं गुरें चुकवीलीं ॥1॥ खेळ खेळतां फोडिल्या डोया । आपण होय निराळा ॥ध्रु.॥ मारिती माया घेती जीव । नाहीं कीव अन्यायें ॥2॥ तुका कान्होबा मागें । तया अंगें कळों आलें ॥3॥ 230 आतां हें चि जेऊं हें चि जेऊं । सवें घेऊं सिदोरी ॥1॥ हरिनामाचा खिचडा केला । प्रेमें मोहिला साधनें ॥ध्रु.॥ चवीं चवीं घेऊं घास । ब्रह्मरस आवडी ॥2॥ तुका ह्मणे गोड लागे । तों तों मागे रसना ॥3॥ 231 अवघें चि गोड जालें । मागीलये भरी आलें ॥1॥ साहए जाला पांडुरंग । दिला अभ्यंतरीं संग ॥ध्रु.॥ थडिये पावतां तो वाव । मागें वाहावतां ठाव ॥2॥ तुका ह्मणे गेलें । स्वप्नींचें जागें जालें ॥3॥ 232 तुजसवें येतों हरी । आह्मां लाज नाहीं तरी । उचलिला गिरी । चांग तइप वांचलों ॥1॥ मोडा आतां खेळ । गाइऩ गेल्या जाला वेळ । फांकल्या ओढाळ । नाहीं तो चि आवरा ॥ध्रु.॥ चांग दैवें यमुनेसी वांचलों बुडतां । निलाजिरीं आह्मी नाहीं भय धाक या अनंता ॥2॥ खातों आगी माती । आतां पुरे हा सांगाती । भोंवतां भोंवेल। आह्मां वाटतें हें चित्तीं ॥3॥ तुका ह्मणे उरी नाहीं तुजसवें। शाहाणे या भावें दुरी छंद भोिळयां सवें ॥4॥ 233 नको आह्मांसवें गोपाळा । येऊं ओढाळा तुझ्या गाइऩ ॥1॥ कोण धांवें त्यांच्या लागें । मागें मागें येरझारी ॥ध्रु.॥ न बैसती एके ठायीं । धांवती दाही दाहा वाटां ॥2॥ तुका ह्मणे तू राख मनेरी। मग त्या येरी आह्मी जाणों ॥3॥ 234 मागायास गेलों सिदोरी । तुझ्या मायाघरीं गांजियेलों ॥1॥ तुजविणें ते नेदी कोणा । सांगतां खुणा जिवें गेलों ॥ध्रु.॥ वांयांविण केली येरझार । आतां पुरे घर तुझी माया ॥2॥ तुका ह्मणे तूं आह्मां वेगळा । राहें गोपाळा ह्मणउनी ॥3॥ 235 काकुलती येतो हरी । क्षणभरी निवडितां ॥1॥ तुमची मज लागली सवे । ठायींचे नवे नव्हों गडी ॥ध्रु.॥ आणीक बोलाविती फार । बहु थोर नावडती ॥2॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । तुका ह्मणे मिठी घाली जिवें ॥3॥ 236 वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥1॥ हरि बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥ भवनदीचा न कळे पार । कािळया माजी थोर विखार ॥2॥ तुका ह्मणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥3॥ 237 अवघीं मिळोनि कोल्हाळ केला । आतां होता ह्मणती गेला ॥1॥ आपलिया रडती भावें । जयासवें जयापरी ॥ध्रु.॥ चुकलों आह्मी खेळतां खेळ । गेला गोपाळ हातींचा ॥2॥ तुका ह्मणे धांवती थडी । न घली उडी आंत कोणी ॥3॥ 238 भ्यालीं जिवा चुकलीं देवा । नाहीं ठावा जवळीं तो ॥1॥ आहाकटा करिती हाय । हात डोकें पिटिती पाय ॥ध्रु.॥ जवळी होतां न कळे आह्मां । गेल्या सीमा नाहीं दुःखा ॥2॥ तुका ह्मणे हा लाघवी मोटा । पाहे खोटा खरा भाव ॥3॥ 239 कािळया नाथूनि आला वरी । पैल हरी दाखविती ॥1॥ दुसरिया भावें न कळे कोणा । होय नव्हेसा संदेह मना ॥ध्रु.॥ रूपा भिन्न पालट जाला । गोरें सांवळेंसा पैं देखिला ॥2॥ आश्वासीत आला करें । तुका खरें ह्मणे देव ॥3॥ 240 हरि गोपाळांसवें सकळां । भेटे गऑया गळा मेळवूनी ॥1॥ भाविकें त्यांची आवडी मोठी । सांगे गोष्टी जीविंचिया ॥ध्रु.॥ योगियांच्या ध्याना जो नये । भाकरी त्यांच्या मागोनि खाये ॥2॥ तुका ह्मणे असे शाहाणियां दुरी । बोबडियां दास कामारी ॥3॥ 241 धांव कान्होबा गेल्या गाइऩ । न ह्मणे मी कोण ही काइऩ ॥1॥ आपुलियांचें वचन देवा । गोड सेवा करीतसे ॥ध्रु.॥ मागतां आधीं द्यावा डाव । बिळया मी तो नाहीं भाव ॥2॥ तुका ह्मणे ऐशा सवें । अनुसरावें जीवेंभावें ॥3॥ 242 धाकुटएाचे मुखीं घांस घाली माता । वरी करी सत्ता शाहाणियां ॥1॥ ऐसें जाणपणें पडिलें अंतर । वाढे तों तों थोर अंतराय ॥ध्रु.॥ दोन्ही उभयतां आपण चि व्याली । आवडीची चाली भिन्न भिन्न ॥2॥ तुका ह्मणे अंगापासूनि निराळें । निवडिलें बळें रडतें स्तनीं ॥3॥ 243 देवाचे ह्मणोनि देवीं अनादर । हें मोठें आश्चर्य वाटतसे ॥1॥ आतां येरा जना ह्मणावें तें काइऩ । जया भार डोइऩ संसाराचा ॥ध्रु.॥ त्यजुनी संसार अभिमान सांटा । जुलूम हा मोटा दिसतसे ॥2॥ तुका ह्मणे अळस करूनियां साहे । बळें कैसे पाहें वांयां जाती ॥3॥ 244 उपदेश तो भलत्या हातीं । जाला चित्तीं धरावा ॥1॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥ स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरविती ॥2॥ तुका ह्मणे रत्नसार । परि उपकार चिंधीचे ॥3॥ 245 संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥1॥ पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥ तुका ह्मणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥2॥ 246 चुंबळीचा करी चुंबळीशीं संग । अंगीं वसे रंग क्रियाहीन ॥1॥ बीजा ऐसें फळ दावी परिपाकीं । परिमळ लौकिकीं जाती ऐसा ॥ध्रु.॥ माकडाच्या गळां रत्न कुळांगना । सांडूनियां सुना बिदी धुंडी ॥2॥ तुका ह्मणे ऐसा व्याली ते गाढवी । फजिती ते व्हावी आहे पुढें ॥3॥ 247 सांपडला संदीं । मग बिळया पडे फंदीं ॥1॥ ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥ दाता मागे दान । जाय याचका शरण ॥2॥ तुका ह्मणे नेणां । काय सांगों नारायणा ॥3॥ 248 सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥1॥ आला डोऑयांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥ अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥2॥ तुका ह्मणे नाड । पाप ठाके हिता आड ॥3॥ 249 न देखोन कांहीं । म्या पाहिलें सकळ ही ॥1॥ जालों अवघियांपरी । मी हें माझें ठेलें दुरी ॥ध्रु.॥ न घेतां घेतलें । हातें पायें उसंतिलें ॥2॥ खादलें न खातां । रसना रस जाली घेतां ॥3॥ न बोलोनि बोलें । केलें प्रगट झांकिलें ॥4॥ नाइकिलें कानीं। तुका ह्मणे आलें मनीं ॥5॥ ब्रह्मचारी फिर्याद गेला - अभंग 2 250 काखे कडासन आड पडे । खडबड खडबडे हुसकलें ॥1॥ दादकरा दादकरा । फजितखोरा लाज नाहीं ॥ध्रु.॥ अवघा जाला राम राम । कोणी कर्म आचरे ना ॥2॥ हरिदासांच्या पडती पायां । ह्मणती तयां नागवावें ॥3॥ दोहीं ठायीं फजीत जालें । पारणें केलें अवकळा ॥4॥ तुका ह्मणे नाश केला । विटंबिला वेश जिहीं ॥5॥ 251 कुटुंबाचा केला त्याग । नाहीं राग जंव गेला ॥1॥ भजन तें वोंगळवाणें । नरका जाणें चुके ना ॥ध्रु.॥ अक्षराची केली आटी । जरी पोटीं संतनिंदा ॥2॥ तुका ह्मणे मागें पाय । तया जाय स्थळासि ॥3॥ ॥2॥ 252 तारतिम वरी तोंडा च पुरतें । अंतरा हें येतें अंतरीचें ॥1॥ ऐसी काय बरी दिसे ठकाठकी । दिसतें लौकिकीं सत्या ऐसें ॥ध्रु.॥ भोजनांत द्यावें विष कालवूनि । मोहचाळवणी मारावया ॥2॥ तुका ह्मणे मैंद देखों नेदी कुडें । आदर चि पुढें सोंग दावी ॥3॥ 253 ब्रह्मनिष्ठ काडी । जरी जीवानांवें मोडी ॥1॥ तया घडली गुरुहत्या । गेला उपदेश तो मिथ्या ॥ध्रु.॥ सांगितलें कानीं। रूप आपुलें वाखाणी ॥2॥ भूतांच्या मत्सरें । ब्रह्मYाान नेलें चोरें ॥3॥ शिकल्या सांगे गोष्टी । भेद क्रोध वाहे पोटीं ॥4॥ निंदा स्तुति स्तवनीं । तुका ह्मणे वेंची वाणी ॥5॥ 254 इहलोकींचा हा देहे । देव इिच्छताती पाहें ॥1॥ धन्य आह्मी जन्मा आलों । दास विठोबाचे जालों ॥ध्रु.॥ आयुष्याच्या या साधनें । सिच्चदानंद पदवी घेणें ॥2॥ तुका ह्मणे पावठणी । करूं स्वर्गाची निशाणी ॥3॥ 255 पंडित वाचक जरी जाला पुरता । तरी कृष्णकथा ऐके भावें ॥1॥ क्षीर तुपा साकरे जालिया भेटी । तैसी पडे मिठी गोडपणें ॥ध्रु.॥ जाणोनियां लाभ घेइप हा पदरीं । गोड गोडावरी सेवीं बापा ॥2॥ जाणिवेचें मूळ उपडोनी खोड । जरी तुज चाड आहे तुझी ॥3॥ नाना परिमळद्रव्य उपचार । अंगी उटी सारचंदनाची ॥4॥ जेविलियाविण शून्य ते शृंगार । तैसी गोडी हरिकथेविण ॥5॥ ज्याकारणें वेदश्रुति ही पुराणें । तें चि विठ्ठलनाणें तिष्ठे कथे ॥6॥ तुका ह्मणे येर दगडाचीं पेंवें । खळखळ आवघें मूळ तेथें॥7॥ 256 आणिकांच्या कापिती माना । निष्ठ‍पणा पार नाहीं ॥1॥ करिती बेटे उसणवारी । यमपुरी भोगावया ॥ध्रु.॥ सेंदराचें दैवत केलें । नवस बोले तयासि ॥2॥ तुका ह्मणे नाचति पोरें । खोडितां येरें अंग दुखे ॥3॥ 257 गंधर्व अिग्न सोम भोगिती कुमारी । कोठें चराचरीं त्याग केला ॥1॥ गायत्री स्वमुखें भक्षीतसे मळ । मिळाल्या वाहाळ गंगाओघ ॥ध्रु.॥ कागाचिये विष्ठें जन्म पिंपळासि । पांडवकुळासि पाहातां दोष ॥2॥ शकुंतळा सूत कर्ण शृंगी व्यास । यांच्या नामें नाश पातकांसि ॥3॥ गणिका अजामेळ कुब्जा तो विदुर । पाहातां विचार पिंगळेचा ॥4॥ वाल्हा विश्वामित्र वसिष्ठ नारद । यांचे पूर्व शुद्ध काय आहे ॥5॥ न व्हावी तीं जालीं कर्में नरनारी । अनुतापें हरी स्मरतां मुH ॥6॥ तुका ह्मणे पूर्व नाठवी श्रीहरी । मूळ जो उच्चारी नरक त्यासि ॥7॥ 258 सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥1॥ मुHाफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥ वेदपरायण बधिरा सांगे Yाान । तयाची ते खुण काय जाणे ॥2॥ तुका ह्मणे ज्याचें तो चि एक जाणे । भHीचें महिमान साधु जाणे ॥3॥ 259 ऐसा हा लौकिक कदा राखवेना । पतितपावना देवराया ॥1॥ संसार करितां ह्मणती हा दोषी । टाकितां आळसी पोटपोसा ॥ध्रु.॥ आचार करितां ह्मणती हा पसारा । न करितां नरा निंदिताती ॥2॥ संतसंग करितां ह्मणती हा उपदेशी । येरा अभाग्यासि Yाान नाहीं ॥3॥ धन नाहीं त्यासि ठायींचा करंटा । समर्थासि ताठा लाविताती ॥4॥ बहु बोलों जातां ह्मणति हा वाचाळ । न बोलतां सकळ ह्मणती गर्वी ॥5॥ भेटिसि न वजातां ह्मणती हा निष्ठ‍ । येतां जातां घर बुडविलें ॥6॥ लग्न करूं जातां ह्मणती हा मातला। न करितां जाला नपुंसक ॥7॥ निपुत्रिका ह्मणती पहा हो चांडाळ। पातकाचें मूळ पोरवडा ॥8॥ लोक जैसा लोक धरितां धरवे ना। अभHा जिरे ना संतसंग ॥9॥ तुका ह्मणे आतां ऐकावें वचन । त्यजुनियां जन भिH करा ॥10॥ 260 धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आह्मांसि ॥1॥ वाचा बोलों वेदनीती । करूं संतीं केलें तें ॥ध्रु.॥ न बाणतां िस्थति अंगीं । कर्म त्यागी लंड तो ॥2॥ तुका ह्मणे अधम त्यासी । भिH दूषी हरीची ॥3॥ 261 चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तो चि आह्मीं कंठीं साठविला ॥1॥ काय एक उणें आमुचिये घरीं । वोळगती द्वारीं रििद्धसिद्धी ॥ध्रु.॥ असुर जयानें घातले तोडरीं । तो आह्मांसि जोडी कर दोन्ही ॥2॥ रूप नाहीं रेखा जयासि आकार । आह्मीं तो साकार भHीं केला ॥3॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आह्मासाठीं ॥4॥ रििद्धसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥5॥ तुका ह्मणे आह्मी देवाहूनि बळी। जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥6॥ 262 केला मातीचा पशुपति । परि मातीसि काय ह्मणती । शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ॥1॥ तैसे पूजिती आह्मां संत । पूजा घेतो भगवंत । आह्मी किंकर संतांचे दास। संतपदवी नको आह्मांस ॥ध्रु.॥ केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु। विष्णुपूजा विष्णुसि अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपें ॥2॥ केली कांशाची जगदंबा । परि कांसें नव्हे अंबा । पूजा अंबेची अंबेला घेणें । कांसें राहे कांसेंपणें ॥3॥ ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका ह्मणे केली कांजी । ज्याची पूजा त्याणें चि घेणें। आह्मी पाषाणरूप राहणें ॥4॥ 263 ते माझे सोयरे सज्जन सांगाती । पाय आठविती विठोबाचे ॥1॥ येरा मानी विधि पाळणापुरतें । देवाचीं तीं भूतें ह्मणोनियां ॥ध्रु.॥ सर्वभावें जालों वैष्णवांचा दास । करीन त्यांच्या आस उिच्छष्टाची ॥2॥ तुका ह्मणे जैसे मानती हरिदास । तैशी नाहीं आस आणिकांची ॥3॥ 264 दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निदऩळण कंटकांचें ॥1॥ पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥2॥ तुका ह्मणे धर्म रक्षावया साठीं । देवास ही आटी जन्म घेणें ॥3॥ 265 करावें गोमटें । बाळा माते तें उमटे ॥1॥ आपुलिया जीवाहूनी । असे वाल्हें तें जननी ॥ध्रु.॥ वियोग तें तिस । त्याच्या उपचारें तें विष ॥2॥ तुका ह्मणे पायें । डोळा सुखावे ज्या न्यायें ॥3॥ 266 कन्या सासु†यासि जाये । मागें परतोनी पाहे ॥1॥ तैसें जालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा ॥ध्रु.॥ चुकलिया माये। बाळ हुरू हुरू पाहे ॥2॥ जीवना वेगळी मासोळी । तुका ह्मणे तळमळी ॥3॥ 267 हातीं होन दावी बेना । करिती लेंकीच्या धारणा ॥1॥ ऐसे धर्म जाले कळीं । पुण्य रंक पाप बळी ॥ध्रु.॥ सांडिले आचार। द्विज चाहाड जाले चोर ॥2॥ टिळे लपविती पातडीं । लेती विजारा कातडीं ॥3॥ बैसोनियां तHां । अन्नेंविण पिडिती लोकां ॥4॥ मुदबख लिहिणें । तेलतुपावरी जिणें ॥5॥ नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ॥6॥ राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुिश्चतासी तोडी ॥7॥ वैश्यशूद्रादिक । हे तों सहज नीच लोक ॥8॥ अवघे बाहए रंग । आंत हिरवें वरी सोंग ॥9॥ तुका ह्मणे देवा । काय निद्रा केली धांवा ॥10॥ 268 साळंकृत कन्यादान । करितां पृथ्वीसमान ॥1॥ परि तें न कळे या मूढा । येइल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥ आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥2॥ सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥3॥ अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥4॥ तुका ह्मणे सोस । दुःख आतां पुढें नास ॥5॥ 269 दिवटएा वाद्यें लावुनि खाणें । करूनि मंडण दिली हातीं ॥1॥ नवरा नेइऩ नवरी घरा । पूजन वरा पाद्याचें ॥ध्रु.॥ गौरविली विहीण व्याही । घडिलें कांहीं ठेवूं नका ॥2॥ करूं द्यावें न्हावें वरें। ठायीचें कां रे न कळे चि ॥3॥ व†हडियांचे लागे पाठीं। जैसी उटिका तेलीं ॥4॥ तुका ह्मणे जोडिला थुंका । पुढें नरका सामग्री ॥5॥ 270 ब्रह्महत्या मारिल्या गाइऩ । आणीक काइऩ पाप केलें ॥1॥ ऐका जेणें विकिली कन्या । पवाडे त्या सुन्याचे ॥ध्रु.॥ नरमांस खादली भाडी । हाका मारी ह्मणोनि ॥2॥ अवघें पाप केलें तेणें । जेणें सोनें अभिळााषिलें ॥3॥ उच्चारितां मज तें पाप । जिव्हे कांप सुटतसे ॥4॥ तुका ह्मणे कोरान्न रांड । बेटा भांड मागे ना कां ॥5॥ 271 याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥1॥ फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥ ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥2॥ तुका ह्मणे त्याचें अन्न । मद्यपाना समान ॥3॥ 272 कपट कांहीं एक । नेणें भुलवायाचें लोक ॥1॥ तुमचें करितों कीर्त्तन । गातों उत्तम ते गुण ॥ध्रु.॥ दाऊं नेणें जडीबुटी । चमत्कार उठाउठी ॥2॥ नाहीं शिष्यशाखा । सांगों अयाचित लोकां ॥3॥ नव्हें मठपति । नाहीं चाहुरांची वृित्त ॥4॥ नाहीं देवार्चन । असे मांडिलें दुकान ॥5॥ नाहीं वेताळ प्रसन्न । कांहीं सांगों खाण खुण ॥6॥ नव्हें पुराणिक । करणें सांगणें आणीक ॥7॥ नेणें वाद घटा पटा । करितां पंडित करंटा ॥8॥ नाहीं जाळीत भणदीं । उदो ह्मणोनि आनंदी ॥9॥ नाहीं हालवीत माळा । भोंवतें मेळवुनि गबाळा ॥10॥ आगमीचें कुडें नेणें । स्तंभन मोहन उच्चाटणें ॥11॥ नव्हें यांच्या ऐसा । तुका निरयवासी पिसा ॥12॥ 273 रडोनियां मान । कोण मागतां भूषण ॥1॥ देवें दिलें तरी गोड । राहे रुचि आणि कोड ॥ध्रु.॥ लावितां लावणी । विके भीके केज्या दानी ॥2॥ तुका ह्मणे धीरा । विण कैसा होतो हिरा॥3॥ 274 पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥1॥ सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥ संतां ठाया ठाव पूजनाची इच्छा । जीवनीं च वळसा सांपडला ॥2॥ तुका ह्मणे एकाएकीं वरासनें । दुजें तेथें भिन्न अशोभ्य तें ॥3॥ 275 जेणें मुखें स्तवी । तें चि निंदे पाठीं लावी ॥1॥ ऐसी अधमाची याती । लोपी सोनें खाय माती ॥ध्रु.॥ गुदद्वारा वाटे । मिष्टान्नांचा नरक लोटे ॥2॥ विंचु लाभाविण । तुका ह्मणे वाहे शीण ॥3॥ 276 अधमाची यारी । रंग पतंगाचे परी ॥1॥ विटे न लगतां क्षण । मोल जाय वांयां विण ॥ध्रु.॥ सर्पाचिया परी । विषें भरला कल्हारीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । मज झणी ऐसे दावा ॥3॥ 277 आणिकांची स्तुति आह्मां ब्रह्महत्या । एका वांचूनि त्या पांडुरंगा ॥1॥ आह्मां विष्णुदासां एकविध भाव । न ह्मणों या देव आणिकांसि ॥ध्रु.॥ शतखंड माझी होइऩल रसना । जरी या वचना पालटेन ॥2॥ तुका ह्मणे मज आणिका संकल्पें । अवघीं च पापें घडतील ॥3॥ 278 तान्हेल्याची धणी । फिटे गंगा नव्हे उणी ॥1॥ माझे मनोरथ सिद्धी । पाववावे कृपानिधी ॥ध्रु.॥ तूं तों उदाराचा राणा । माझी अल्प चि वासना ॥2॥ कृपादृष्टीं पाहें । तुका ह्मणे होइप साहे ॥3॥ 279 संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥1॥ येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्पें देवा शिरीं ॥ध्रु.॥ अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी [[पोळी]] ॥2॥ तुका ह्मणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥3॥ 280 करणें तें देवा । हे चि एक पावे सेवा ॥1॥ अवघें घडे येणे सांग । भक्त देवाचें तें अंग ॥ध्रु.॥ हें चि एक वर्म । काय बोलिला तो धर्म ॥2॥ तुका ह्मणे खरें । खरें त्रिवाचा उत्तरें ॥3॥ 281 मागें नेणपणें घडलें तें क्षमा । आतां देतों सीमा करूनियां ॥1॥ परनारीचें जया घडलें गमन । दावीतो वदन जननीरत ॥ध्रु.॥ उपदेशा वरी मन नाहीं हातीं । तो आह्मां पुढती पाहूं नये ॥2॥ तुका ह्मणे साक्षी असों द्यावें मन । घातली ते आण पाळावया ॥3॥ 282 आणिकांच्या घातें । ज्यांचीं निवतील चित्तें ॥1॥ ते चि ओळखावे पापी । निरयवासी शीघ्रकोपी ॥ध्रु.॥ कान पसरोनी । ऐके वदे दुष्ट वाणी ॥2॥ तुका ह्मणे भांडा । धीर नाहीं ज्याच्या तोंडा॥3॥ हनुमंतस्तुति - अभंग 4 283 शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥1॥ काय भHीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥ शूर आणि धीर । स्वामिकाजीं तूं सादर ॥2॥ तुका ह्मणे रुद्रा । अंजनीचिया कुमरा ॥3॥ 284 केली सीताशुद्धी । मूळ रामायणा आधीं ॥1॥ ऐसा प्रतापी गहन । सुरां सकळ भHांचें भूषण ॥ध्रु.॥ जाऊनि पाताळा। केली देवाची अवकळा ॥2॥ राम लक्षुमण । नेले आणिले चोरून ॥3॥ जोडूनियां कर । उभा सन्मुख समोर ॥4॥ तुका ह्मणे जपें । वायुसुता जाती पापें ॥5॥ 285 काम घातला बांदोडी । काळ केला देशधडी ॥1॥ तया माझें दंडवत । कपिकुळीं हनूमंत ॥ध्रु.॥ शरीर वज्रा ऐसें । कवळी ब्रह्मांड जो पुच्छे ॥2॥ रामाच्या सेवका । शरण आलों ह्मणे तुका ॥3॥ 286 हनुमंत महाबळी । रावणाची दाढी जाळी ॥1॥ तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥ध्रु.॥ करोनी उdाण । केलें लंकेचें दहन ॥2॥ जाळीयेली लंका । धन्य धन्य ह्मणे तुका ॥3॥ ॥4॥ 287 कुंभ अवघा एक आवा । पाकीं एकीं गुफे डावा ॥1॥ ऐसे भिन्न भिन्न साटे । केले प्रारब्धानें वांटे ॥ध्रु.॥ हिरे दगड एक खाणी । कैचें विजातीसी पाणी ॥2॥ तुका ह्मणे शिरीं । एक एकाची पायरी ॥3॥ 288 मांडे पु†या मुखें सांगों जाणे मात । तोंडीं लाळ हात चोळी रिते ॥1॥ ऐसियाच्या गोष्टी फिक्या मिठेंविण । रुचि नेदी अन्न चवी नाहीं ॥ध्रु.॥ बोलों जाणे अंगीं नाहीं शूरपण । काय तें वचन जाळावें तें ॥2॥ तुका ह्मणे बहुतोंडे जे वाचाळ । तेंग तें च मूळ लटिक्याचें ॥3॥ 289 न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी ॥1॥ अंतरीचें धांवे स्वभावें बाहेरी । धरितां ही परी आवरे ना ॥ध्रु.॥ सूर्य नाहीं जागें करीत या जना । प्रकाश किरणा कर ह्मुन ॥2॥ तुका ह्मणे मेघ नाचवी मयूरें । लपवितां खरें येत नाहीं ॥3॥ 290 चंदनाचे हात पाय ही चंदन । परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥1॥ दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार । सर्वांगें साकर अवघी गोड ॥ध्रु.॥ तुका ह्मणे तैसा सज्जनापासून । पाहातां अवगुण मिळे चि ना ॥2॥ 291 मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण । मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ॥1॥ मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली । मनें इच्छा पुरविली । मन माउली सकळांची ॥ध्रु.॥ मन गुरू आणि शिष्य । करी आपुलें चि दास्य । प्रसन्न आपआपणास। गति अथवा अधोगति ॥2॥ साधक वाचक पंडित । श्रोते वHे ऐका मात । नाहीं नाहीं आनुदैवत । तुका ह्मणे दुसरें ॥3॥ 292 मायबापें जरी सर्पीण बोका । त्यांचे संगें सुखा न पवे बाळ ॥1॥ चंदनाचा शूळ सोनियाची बेडी । सुख नेदी फोडी प्राण नाशी ॥2॥ तुका ह्मणे नरकीं घाली अभिमान । जरी होय Yाान गर्व ताठा ॥3॥ 293 शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥1॥ पंडित हे Yाानी करितील कथा । न मिळती अर्था निजसुखा ॥2॥ तुका ह्मणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे नाहीं ठावी वस्तु ॥3॥ 294 प्रारब्ध क्रियमाण । भHां संचित नाहीं जाण ॥1॥ अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ सत्वरजतमबाधा। नव्हे हरिभHांसि कदा ॥2॥ खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ॥3॥ देवभHपण । तुका ह्मणे नाहीं भिन्न ॥4॥ 295 शास्त्राचें जें सार वेदांची जो मूतिऩ । तो माझा सांगाती प्राणसखा ॥1॥ ह्मणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥ सगुण निर्गुण जयाचीं अंगें । तो चि आह्मां संगें क्रीडा करी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी विधीचे जनिते । स्वयंभू आइते केले नव्हों ॥3॥ 296 ऐका महिमा आवडीचीं । बोरें खाय भिलटीचीं ॥1॥ थोर प्रेमाचा भुकेला । हा चि दुष्काळ तयाला । अष्टमा सिद्धींला । न मनी क्षीरसागराला ॥ध्रु.॥ पव्हे सुदामदेवाचे । फके मारी कोरडे च ॥2॥ न ह्मणे उिच्छष्ट अथवा थोडे । तुका ह्मणे भHीपुढें ॥3॥ 297 कोणें तुझा सांग केला अंगीकार । नििश्चति त्वां थोर मानियेली ॥1॥ कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥ तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥2॥ कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥3॥ तुका ह्मणे यासि सांगा कोणी तरी। विसरला हरी मायबाप ॥4॥ 298 साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥1॥ साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥2॥ असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका ह्मणे ॥3॥ 299 आमचे गोसावी अयाचितवृत्ती । करवी शिष्याहातीं उपदेश ॥1॥ दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥1॥ तुका ह्मणे वेष विटंबिला त्यांनी । सोंगसंपादणी करिती परी॥3॥ 300 मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥1॥ खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥ मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥2॥ स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥3॥ सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुH शीण तुका ह्मणे ॥4॥''' [[वर्ग:गाथा]] lqcc0mqusyhukk485xtrrplqob4seur तुकाराम गाथा/ ३०१ ते ६०० 0 1534 36910 36883 2026-09-19T19:41:54Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36910 wikitext text/x-wiki 301 माझें ह्मणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥1॥ कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥2॥ तुका ह्मणे किती सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥3॥ 302 आंधऑयासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥1॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥2॥ तुका ह्मणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥3॥ 303 छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥1॥ येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥ नावडे हरिकथा। त्याची व्यभिचारीण माता ॥2॥ तुका ह्मणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥3॥ 304 बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥1॥ मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥ संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥2॥ कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥3॥ तुका ह्मणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥4॥ 305 अंगीं ज्वर तया नावडे साकर । जन तो इतर गोडी जाणे ॥1॥ एकाचिये तोंडीं पडिली ते माती । अवघे ते खाती पोटभरी ॥ध्रु.॥ चारितां बळें येत असे दांतीं । मागोनियां घेती भाग्यवंत ॥2॥ तुका ह्मणे नसे संचित हें बरें । तयासि दुसरें काय करी ॥3॥ 306 धिग जीणें तो बाइऩले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥1॥ धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥ धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥2॥ धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥3॥ तुका ह्मणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥4॥ 307 अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥1॥ मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥ विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥2॥ अणीक एक कोड । नरका जावयाची चाड। तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥3॥ तुका ह्मणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥4॥ 308 अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥1॥ नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाषांडिया ॥ध्रु.॥ जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शािब्दकांसि ॥2॥ तुका ह्मणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥3॥ 309 एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥1॥ दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥ एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥2॥ एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥3॥ एकां भिH पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥4॥ वर्म पोटीं एका । फळें दोन ह्मणे तुका ॥5॥ 310 काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥1॥ आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥ देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥2॥ तुका ह्मणे भावें । माझ्या मज समजावें ॥3॥ 311 भजन घाली भोगावरी । अकर्तव्य मनीं धरी ॥1॥ धिग त्याचें साधुपण । विटाळूनी वर्ते मन ॥ध्रु.॥ नाहीं वैराग्याचा लेश । अर्थचाड जावें आस ॥2॥ हें ना तें सें जालें । तुका ह्मणे वांयां गेलें ॥3॥ 312 एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥1॥ ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥ अशुद्ध विटाळसीचें खळ । [[विडा]] भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥2॥ सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बिळवंत ॥3॥ आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥4॥ तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका ह्मणे व्रत । एकादशी चुकलीया ॥5॥ 313 करवितां व्रत अधॉ पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥1॥ शुद्धबुिद्ध होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥ आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥2॥ देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥3॥ तुका ह्मणे तप तीर्थ व्रत याग । भिH हे मारग मोडूं नये ॥4॥ 314 इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥1॥ अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥ अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥2॥ तुका ह्मणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥3॥ 315 वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥1॥ विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥ जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥2॥ तुका ह्मणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥3॥ 316 विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥1॥ मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥ बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥2॥ तुका ह्मणे भावें । कृपा करीजेते देवें ॥3॥ 317 येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥1॥ वैकुंठींच्या लावूं वाटा ।सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥ येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥2॥ तुका ह्मणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥3॥ 318 उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥1॥ बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥ तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥2॥ तुका ह्मणे नये आह्मां । पुढें कामा गबाळ ॥3॥ 319 बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥1॥ काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥ दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥2॥ तुका ह्मणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥3॥ 320 बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥1॥ भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥ विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥2॥ सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥3॥ गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥4॥ तुका ह्मणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥5॥ 321 दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥1॥ आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥ देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥2॥ तुका ह्मणे नाद । जाला अवघा गोविंद ॥3॥ 322 कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥1॥ तुह्मी दयावंत कैसे । कीतिऩ जगामाजी वसे ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥2॥ तुका ह्मणे देवा । माझा करावा कुठावा ॥3॥ 323 ठायींची ओळखी । येइल टाकुं टाका सुखीं ॥1॥ तुमचा जाइऩल इऩमान । माझे कपाळीं पतन ॥ध्रु.॥ ठेविला तो ठेवा। अभिळाषें बुडवावा ॥2॥ मनीं न विचारा । तुका ह्मणे हे दातारा ॥3॥ 324 तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥1॥ रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥ नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥2॥ तुका ह्मणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥3॥ 325 गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥1॥ वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥ कमाइऩच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥2॥ तुका ह्मणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥3॥ 326 पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥1॥ नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥ विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥2॥ तुका ह्मणे जपें । संतांचिया जाती पापें ॥3॥ 327 देव होइऩजेत देवाचे संगती । पतन पंगती जगाचिया ॥1॥ दोहींकडे दोन्ही वाहातील वाटा । करितील सांटा आपुलाला ॥ध्रु.॥ दाखविले परी नाहीं वजिऩजेतां । आला तो तो चित्ता भाग भरा ॥2॥ तुका ह्मणे अंगीं आवडीचें बळ । उपदेश मूळबीजमात्र ॥3॥ 328 शोधिसील मूळें । त्याचें करीसी वाटोळें ॥1॥ ऐसे संतांचे बोभाट । तुझे बहु जाले तट ॥ध्रु.॥ लौकिका बाहेरी । घाली रोंखीं जया धरी ॥2॥ तुका ह्मणे गुण । तुझा लागलिया शून्य ॥3॥ 329 वैद वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥1॥ काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥ नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥2॥ जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥3॥ 330 मारगीं बहुत । या चि गेले साधुसंत ॥1॥ नका जाऊ आडराणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥ध्रु.॥ चोखािळल्या वाटा । न लगे पुसाव्या धोपटा ॥2॥ झळकती पताका । गरुड टके ह्मणे तुका ॥3॥ 331 कातिऩकीचा सोहळा । चला जाऊं पाहूं डोळां । आले वैकुंठ जवळां । सन्निध पंढरीये ॥1॥ पीक पिकलें घुमरी । प्रेम न समाये अंबरीं । अवघी मातली पंढरी । घरोघरीं सुकाळ ॥ध्रु.॥ चालती िस्थर िस्थर । गरुड टकयांचे भार । गर्जती गंभीर । टाळ श्रुति मृदंग ॥2॥ मिळालिया भद्रजाती । कैशा आनंदें डुलती । शूर उठावती । एका एक आगळे ॥3॥ नामामृत कल्लोळ । वृंदें कोंदलीं सकळ । आले वैष्णवदळ । किळकाळ कांपती ॥4॥ आस करिती ब्रह्मादिक । देखुनि वाळवंटीचें सुख । धन्य धन्य मृत्युलोक। ह्मणती भाग्याचे कैसे ॥5॥ मरण मुिH वाराणसी । पितृॠण गया नासी । उधार नाहीं पंढरीसि । पायापाशीं विठोबाच्या ॥6॥ तुका ह्मणे आतां । काय करणें आह्मां चिंता । सकळ सिद्धींचा दाता । तो सर्वथा नुपेक्षी ॥7॥ 332 जया दोषां परीहार । नाहीं नाहीं धुंडितां शास्त्र । ते हरती अपार । पंढरपुर देखिलिया ॥1॥ धन्य धन्य भीमातीर । चंद्रभागा सरोवर । पद्मातीर्थी विठ्ठल वीर । क्रीडास्थळ वेणुनादीं ॥ध्रु.॥ सकळतीर्थांचें माहेर । भूवैकुंठ निविऩकार । होतो नामाचा गजर । असुरकाळ कांपती ॥2॥ नाहीं उपमा द्यावया । सम तुल्य आणिका ठाया । धन्य भाग्य जयां । जे पंढरपूर देखती ॥3॥ उपजोनि संसारीं। एक वेळ पाहें पा पंढरी । महा दोषां कैची उरी। देवभH देखिलिया ॥4॥ ऐसी विष्णूची नगरी । चतुर्भुज नर नारी। सुदर्शन घरटी करी । रीग न पुरे किळकाळा ॥5॥ तें सुख वर्णावया गति। एवढी कैची मज मति । जे पंढरपुरा जाती । ते पावती वैकुंठ ॥6॥ तुका ह्मणे या शब्दाचा । जया विश्वास नाहीं साचा । अधम जन्मांतरिचा। तया पंढरी नावडे ॥7॥ 333 एक नेणतां नाडली । एकां जाणिवेची भुली ॥1॥ बोलों नेणें मुकें । वेडें वाचाळ काय निकें ॥ध्रु.॥ दोहीं सवा नाड। विहीर एकीकडे आड ॥2॥ तुका ह्मणे कर्म । तुझें कळों नेदी वर्म ॥3॥ 334 ह्मणवितों दास । मज एवढी च आस ॥1॥ परी ते अंगीं नाहीं वर्म । करीं आपुला तूं धर्म ॥ध्रु.॥ बडबडितों तोंडें । रितें भावेंविण धेंडें ॥2॥ तुका ह्मणे बरा । दावूं जाणतों पसारा ॥3॥ 335 पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥1॥ हें तों जाणां तुह्मी संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥ पाहिजे तें केलें । सहज प्रसंगीं घडलें ॥2॥ तुका ह्मणे माथा । पायीं ठेवीं तुह्मां संतां ॥3॥ 336 स्वप्नऴिचया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया सेवटीं । जालें लटिकें सकळ ॥1॥ वायां भाकिली करुणा । मूळ पावावया सिणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरि आहे ॥ध्रु.॥ सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥2॥ तुका ह्मणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥3॥ 337 आसुरी स्वभाव निदऩय अंतर । मानसीं निष्ठ‍ अतिवादी ॥1॥ याति कुळ येथें असे अप्रमाण । गुणाचें कारण असे अंगीं ॥ध्रु.॥ काळकुट पितळ सोनें शुद्ध रंग । अंगाचेंच अंग साक्ष देतें ॥2॥ तुका ह्मणे बरी जातीसवें भेटी । नवनीत पोटीं सांटविलें ॥3॥ 338 बाळपणीं हरि । खेळे मथुरेमाझारी । पायीं घागरिया सरी । कडदोरा वांकी । मुख पाहे माता । सुख न माये चित्ता । धन्य मानव संचिता । वोडवलें आजि ॥1॥ बाळ चांगलें वो । बाळ चांगलें वो । ह्मणतां चांगलें । वेळ लागे तया बोलें । जीवापरीस तें वाल्हें । मज आवडतें ॥ध्रु.॥ मिळोनियां याती । येती नारी कुमारी बहुती । नाही आठव त्या चित्तीं । देहभाव कांहीं । विसरल्या घरें । तान्हीं पारठीं लेकुरें । धाक सांडोनियां येरें । तान भूक नाहीं ॥2॥ एकी असतील घरीं । चित्त तयापासीं परी । वेगीं करोनि वोसरी । तेथें जाऊं पाहे । लाज सांडियेली वोज । नाहीं फजितीचें काज । सुख सांडोनियां सेज । तेथें धाव घाली ॥3॥ वेधियेल्या बाळा । नर नारी या सकळा । बाळा खेळवी अबला । त्याही विसरल्या । कुमर कुमारी । नाभाव हा शरीरीं । दृष्टी न फिरे माघारी । तया देखतां हे ॥4॥ वैरभाव नाहीं । आप पर कोणीं कांहीं । शोक मोह दुःख ठायीं । तया निरसलीं । तुका ह्मणे सुखी । केलीं आपणासारिखीं। स्वामी माझा कवतुकें । बाळवेषें खेळे ॥5॥ 339 अशोकाच्या वनीं सीता शोक करी । कां हों अंतरले रघुनाथ दुरी । येउनि गुंफेमाजी दुष्टें केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी ॥1॥ सांगा वो त्रीजटे सखिये ऐसी मात। देइऩल कां नेदी भेटी रघुनाथ । मन उताविळ जाला दुरी पंथ। राहों न सके प्राण माझा कुडी आंत ॥ध्रु.॥ काय दुष्ट आचरण होतें म्यां केलें । तीर्थ व्रत होतें कवणाचें भंगीलें । गाइऩवत्सा पत्नीपुरुषा विघडिलें । न कळे वो संचित चरण अंतरले ॥2॥ नाडियेलें आशा मृगकांतिसोने । धाडिलें रघुनाथा पाठिलागे तेणें । उलंघिली आYाा माव काय मी जाणें । देखुनी सूनाट घेउनि आलें सुनें ॥3॥ नाहीं मूळ मारग लाग अणीक सोये । एकाविण नामें रघुनाथाच्या माये । उपटी पिक्षया एक देउनि पाये । उदकवेढएामध्यें तेथें चाले काये ॥4॥ जनकाची नंदिनी दुःखें ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी । संमोखी त्रीजटा िस्थर िस्थर वो करी । घेइल तुकयास्वामी राम लंकापुरी ॥5॥ 340 वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥1॥ तरी च तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥ आणिकां गुणां पोटीं वाव। दावी भाव आपुला ॥2॥ तुका ह्मणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥3॥ 341 नव्हतों सावचित । तेणें अंतरलें हित ॥1॥ पडिला नामाचा विसर । वाढविला संवसार ॥ध्रु.॥ लटिक्याचे पुरीं वाहोनियां गेलों दुरी ॥2॥ तुका ह्मणे नाव । आह्मां सांपडला भाव ॥3॥ 342 अन्नाच्या परिमळें जरि जाय भूक । तरि कां हे पाक घरोघरीं ॥1॥ आपुलालें तुह्मी करा रे स्वहित । वाचे स्मरा नित्य राम राम ॥ध्रु.॥ देखोनि जीवन जरि जाय तान । तरि कां सांटवण घरोघरीं ॥2॥ देखोनियां छाया सुख न पवीजे । जंव न बैसीजे तया तळीं ॥3 ॥ हित तरी होय गातां अइऩकतां । जरि राहे चित्ता दृढ भाव ॥4॥ तुका ह्मणे होसी भावें चि तूं मुH । काय करिसी युH जाणिवेची॥5॥ 343 काय उणें आह्मां विठोबाचे पाइप । नाहीं ऐसें काइऩ येथें एक ॥1॥ ते हें भोंवतालें ठायीं वांटूं मन । बराडी करून दारोदारीं ॥ध्रु.॥ कोण बळी माझ्या विठोबा वेगळा । आणीक आगळा दुजा सांगा ॥2॥ तुका ह्मणे मोक्ष विठोबाचे गावीं । फुकाचीं लुटावीं भांडारें तीं ॥3॥ 344 सेवितों रस तो वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥1॥ विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तो चि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥ मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥2॥ तुका ह्मणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥3॥ 345 ऐसे ऐसियानें भेटती ते साधु । ज्याच्या दरशनें तुटे भवबंदु । जे कां सिच्चदानंदीं नित्यानंदु । जे कां मोक्षसिद्धी तीर्थ वंदूं रे ॥1॥ भाव सर्वकारण मूळ वंदु । सदा समबुिद्ध नािस्त भेदु। भूतकृपा मोडीं द्वेषकंदु । शत्रु मित्र पुत्र सम करीं बंधु रे ॥ध्रु.॥ मन बुिद्ध काया वाचा शुद्ध करीं । रूप सर्वत्र देखोनि नमस्कारीं । लघुत्व सर्वभावें अंगीकारीं । सांडीमांडी मीतूंपण ऐसी थोरी रे ॥2॥ अर्थकामचाड नाहीं चिंता । मानामान मोह माया मिथ्या । वर्ते समाधानीं जाणोनि नेणता । साधु भेट देती तया अवचिता रे ॥3॥ मनीं दृढ धरीं विश्वास । नाहीं सांडीमांडीचा सायास । साधुदर्शन नित्यकाळ त्यास । तुका ह्मणे जो विटला जाणीवेस रे ॥4॥ 346 भवसागर तरतां । कां रे करीतसां चिंता । पैल उभा दाता । कटीं कर ठेवुनियां ॥1॥ त्याचे पायीं घाला मिठी । मोल नेघे जगजेठी । भावा एका साठीं । खांदां वाहे आपुल्या ॥ध्रु.॥ सुखें करावा संसार । परि न संडावे दोन्ही वार । दया क्षमा घर । चोजवीत येतील ॥2॥ भुिHमुHीची चिंता । नाहीं दैन्य दरिद्रता। तुका ह्मणे दाता । पांडुरंग वोळगिल्या ॥3॥ 347 जें का रंजलें गांजलें । त्यासि ह्मणे जो आपुलें ॥1॥ तो चि साधु ओळखावा । देव तेथें चि जाणावा ॥ध्रु.॥ मृदु सबाहए नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ॥2॥ ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि घरी जो हृदयीं ॥3॥ दया करणें जें पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ॥4॥ तुका ह्मणे सांगूं किती । तो चि भगवंताची मूर्ती ॥5॥ 348 याजसाठीं भिH । जगीं रूढवावया ख्याति ॥1॥ नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥ गौरव यासाटीं । स्वामिसेवेची कसोटी ॥2॥ तुका ह्मणे अळंकारा । देवभH लोकीं खरा ॥3॥ 349 अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानीं ॥1॥ जो हे दूषी हरिची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥2॥ तुका ह्मणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥3॥ 350 कैसा सिंदळीचा । नव्हे ऐसी ज्याची वाचा ॥1॥ वाचे नुच्चारी गोविंदा । सदा करी परनिंदा ॥ध्रु.॥ कैसा निरयगांवा । जाऊं न पवे विसावा ॥2॥ तुका म्हणे दंड । कैसा न पवे तो लंड ॥3॥ 351 आचरणा ठाव ।नाहीं अंगीं स्वता भाव ॥1॥ करवी आणिकांचे घात । खोडी काढूनि पंडित ॥ध्रु.॥ श्वानाचियापरी मिष्टान्नासि विटाळ करी ॥2॥ तुका ह्मणे ऐसा । सटवे चि ना पांचा दिसां ॥3॥ 352 गर्भाचें धारण । तिनें वागविला सिण ॥1॥ व्याली कु†हाडीचा दांडा । वर न घली च तोंडा ॥ध्रु.॥ उपजला काळ । कुळा लाविला विटाळ ॥2॥ तुका ह्मणे जाय । नरका अभHाची माय॥3॥ 353 पतनासि जे नेती । तिचा खोटा स्नेह प्रीती ॥1॥ विधीपुरतें कारण । बहु वारावें वचन ॥ध्रु.॥ सर्वस्वासि नाडी । ऐसी लाघवाची बेडी ॥2॥ तुका ह्मणे दुरी । राखतां हे तों ची बरी ॥3॥ 354 देव आड जाला । तो भोगिता मी उगला । अवघा निवारला । शीण शुभाअशुभाचा ॥1॥ जीवशिवाचें भातुकें । केलें क्रीडाया कौतुकें । कैचीं येथें लोकें । हा आभास अनित्य ॥ध्रु.॥ विष्णुमय खरें जग । येथें लागतसे लाग । वांटिले विभाग । वर्णधर्म हा खेळ तयाचा ॥2॥ अवघी एकाची च वीण । तेथें कैचें भिन्नाभिन्न । वेदपुरुष नारायण । तेणें केला निवाडा ॥3॥ प्रसादाचा रस । तुका लाधला सौरस । पायापाशीं वास । निकट नव्हे निराळा ॥4॥ मंबाजी गोसावी यांनीं स्वामीस पीडा केली - अभंग ॥5॥ 355 न सोडीं न सोडीं न सोडीं । विठोबा चरण न सोडीं ॥1॥ भलतें जड पडो भारी । जीवावरी आगोज ॥ध्रु.॥ शतखंड देह शस्त्रधारी । करितां परी न भीयें ॥2॥ तुका ह्मणे केली आधीं । दृढ बुद्धी सावध ॥3॥ 356 बरवें बरवें केलें विठोबा बरवें । पाहोनि आंत क्षमा अंगी कांटीवरी मारविलें ॥1॥ शिव्या गाळी नीत नाहीं । बहु फार विटंबिलें ॥2॥ तुका ह्मणे क्रोधा हातीं । सोडवूनि घेतलें रे ॥3॥ 357 पावलों पावलों । देवा पावलों रे ॥1॥ बरवें संचित होतें तैसें जालें रें । आतां काय बोलों रे ॥2॥ सोज्ज्वळ कंटकवाटा भावें करूं गेलों रे । तुका ह्मणे करूनि वेगळा केलों रे ॥3॥ 358 कां होती कां होती । देवा एवढी फजीती ॥1॥ मुळीं वर्म नसतों चुकलों । तो मी ऐसें चित्तीं ॥ध्रु.॥ होणार होऊनि गेलें। मिथ्या आतां खंती रे ॥2॥ तुका ह्मणे पुरे आतां । दुर्जनाची संगती रे ॥3॥ 359 सोडवा सोडवा । सोडवा हो अनंता ॥1॥ तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥ कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आह्मी जातां ॥2॥ तुका ह्मणे सखया । माझ्या रखुमाइऩच्या कांता ॥3॥ ॥5॥ 360 पुत्राची वार्ता । शुभ ऐके जेवीं माता ॥1॥ तैसें राहो माझें मन । गातां ऐकतां हरिगुण ॥ध्रु.॥ नादें लुब्ध जाला मृग । देह विसरला अंग ॥2॥ तुका ह्मणे पाहे । कासवीचें पिलें माये ॥3॥ 361 ध्यानी योगीराज बैसले कपाटीं । लागे पाठोवाटीं तयांचिया ॥1॥ तान भुक त्यांचें राखे शीत उष्ण । जाले उदासीन देहभाव ॥ध्रु.॥ कोण सखें तयां आणीक सोयरें । असे त्यां दुसरें हरीविण ॥2॥ कोण सुख त्यांच्या जीवासि आनंद । नाहीं राज्यमद घडी तयां ॥3॥ तुका ह्मणे विष अमृता समान । कृपा नारायण करितां होय ॥4॥ 362 न व्हावें तें जालें देखियेले पाय । आतां फिरूं काय मागें देवा ॥1॥ बहु दिस होतों करीत हे आस । तें आलें सायासें फळ आजि ॥ध्रु.॥ कोठवरि जिणें संसाराच्या आशा । उगवो हा फांसा येथूनियां ॥2॥ बुडालीं तयांचा मूळ ना मारग । लागे तो लाग सांडूनियां ॥3॥ पुढें उलंघितां दुःखाचे डोंगर । नाहीं अंतपार गर्भवासा ॥4॥ तुका ह्मणे कास धरीन पीतांबरीं । तूं भवसागरीं तारूं देवा ॥5॥ 363 वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नास न लगे कांहीं ॥1॥ तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥2॥ तुका ह्मणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥3॥ 364 शोकें शोक वाढे । हिमतीचे धीर गाढे ॥1॥ येथें केले नव्हे काइऩ ॥ लंडीपण खोटें भाइऩ ॥ध्रु.॥ करिती होया होय । परी नव्हे कोणी साहए ॥2॥ तुका ह्मणे घडी । साधिलिया एक थोडी ॥3॥ 365 ह्मणउनी खेळ मांडियेला ऐसा । नाहीं कोणी दिशा वर्जीयेली ॥1॥ माझिया गोतें हें वसलें सकळ । न देखिजे मूळ विटाळाचें ॥ध्रु.॥ करूनि ओळखी दिली एकसरें । न देखों दुसरें विषमासी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं काळापाशीं गोवा । िस्थति मति देवा वांचूनियां ॥3॥ 366 वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥1॥ नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ध्रु.॥ पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥2॥ तुका ह्मणे याती । हो का तयाची भलती ॥3॥ 367 करोत तपादि साधनें । कोणी साधो गोरांजनें ॥1॥ आह्मी न वजों तया वाटा । नाचूं पंढरीचोहटां ॥ध्रु.॥ पावोत आत्मिस्थति । कोणी ह्मणोत उत्तम मुिH ॥2॥ तुका ह्मणे छंद । आह्मां हरिच्या दासां निंद्य ॥3॥ ॥ स्वामीस सद्गुरूची कृपा जाली - अभंग 4 ॥ 368 सद्ग‍ुरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥1॥ सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥ भोजना मागती [[तूप]] पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥2॥ कांहीं कळहे उपजला अंतराय । ह्मणोनियां काय त्वरा जाली ॥3॥ राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण मािळकेची ॥4॥ बाबाजी आपलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि ॥5॥ माघाशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका ह्मणे ॥6॥ 369 माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुराजा ॥1॥ आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें गुंपा कांहीं कोठें ॥ध्रु.॥ जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत ॥2॥ जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटीं ॥3॥ तुका ह्मणे मज दावियेला तारू । कृपेचा सागरु पांडुरंग ॥4॥ 370 घालुनियां भार राहिलों नििश्चतीं । निरविलें संतीं विठोबासि ॥1॥ लावूनियां हातें कुरवािळला माथा । सांगितलें चिंता न करावी ॥ध्रु.॥ कटीं कर सम चरण साजिरे । राहिला भीवरें तीरीं उभा ॥2॥ खुंटले सायास अणिकि या जीवा । धरिले केशवा पाय तुझे ॥3॥ तुज वाटे आतां तें करीं अनंता । तुका ह्मणे संता लाज माझी ॥4॥ 371 माझिये मनींचा जाणा हा निर्धार । जिवासि उदार जालों आतां ॥1॥ तुजविण दुजें न धरीं आणिका । भय लज्जा शंका टाकियेली ॥ध्रु.॥ ठायींचा संबंध तुज मज होता । विशेष अनंता केला संतीं ॥2॥ जीवभाव तुझ्या ठेवियेला पायीं । हें चि आतां नाही लाज तुह्मां ॥3॥ तुका ह्मणे संतीं घातला हावाला । न सोडीं विठ्ठला पाय आतां ॥4॥ ॥4॥ 372 देव सखा जरी । जग अवघें कृपा करी ॥1॥ ऐसा असोनि अनुभव । कासाविस होती जीव ॥ध्रु.॥ देवाची जतन। तया बाधूं न शके अग्न ॥2॥ तुका ह्मणे हरी । प्र†हादासि यत्न करी ॥3॥ 373 भले भणवितां संतांचे सेवक । आइत्याची भीक सुखरूप ॥1॥ ठसावितां बहु लागती सायास । चुकल्या घडे नास अल्प वर्म ॥ध्रु.॥ पाकसिद्धी लागे संचित आइतें । घडतां सोइऩ तें तेव्हां गोड ॥2॥ तुका ह्मणे बरे सांगतां चि गोष्टी । रणभूमि दृष्टी न पडे तों ॥3॥ 374 संतसमागम एखादिया परी । राहावें त्याचे द्वारीं श्वानयाती ॥1॥ तेथें रामनाम होइऩल श्रवण । घडेल भोजन उिच्छष्टाचें ॥ध्रु.॥ कामारी बटीक सेवेचे सेवक । दीनपण रंक तेथें भलें ॥2॥ तुका ह्मणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संतांचिया ॥3॥ 375 एकली राणागोविंदा सवें । गेलें ठावें तें जालें ॥1॥ मज न ह्मणा न ह्मणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥ नव्हती देखिली म्यां वाट । ह्मणोनि हा धीट संग केला ॥2॥ भेणें मिठी दिधली गळां । सेजे जवळ दडालें ॥3॥ सलगी धरी पयोधर। साहाती करमुर सवें ॥4॥ आहेव मी गर्भीणपणें । हें सांगणें कां लागे ॥5॥ तुका ह्मणे सेवटा नेलें । संपादिलें उभयतां ॥6॥ 376 होतें बहुत हें दिवस मानसीं । आजि नवस हे फळले नवसीं । व्हावी भेटी ते जाली गोविंदासीं । आतां सेवा करीन निश्चयेसीं वो ॥1॥ िस्थर िस्थर मज चि साहे करा । बहु कष्ट सोसिल्या येरझारा । येथें आड मज न साहावे वारा । देऊनि कपाट आलें तें दुसरें वारा वो ॥ध्रु.॥ मूळ सत्ता हे सायासाची जोडी । नेदी वेगळें होऊं एकी घडी । नाहीं लौकिक स्मरला आवडी । आता येणें काळें या वो लोभें वेडी वो ॥2॥ उदयीं उदय साधिला अवकाश । नििंश्चतीनें नििंश्चती सावकाश । धरिये गोडी बहुत आला रस । तुका ह्मणे हा मागुता न ये दिवस वो ॥3॥ 377 स्वयें सुखाचे जाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव । अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥1॥ आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल । एका मेघःशामें जलधर वोल । रसीं उताविळ हृदय सखोल वो ॥ध्रु.॥ एक विषय तो सकळांचा हरि । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं । अंध बहिर हे प्रेत लोकां चारी । त्यांची कीतिऩ गाइली पुराणांतरी वो ॥2॥ स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर । परस्परें हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥3॥ भिHवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी । दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरि वो ॥4॥ तुका लाधला हें उिच्छष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून । पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥5॥ 378 आजि का वो तूं दिससी दुिश्चती । ह्मणी एका मन लगे तुझ्या चित्तीं । दिलें ठेवूं तें विसरसी हातीं । नेणों काय बैसला हरि चित्तीं वो ॥1॥ सर सर परती जालीस आतां भांड । कैसें दाखविसी जगासी या तोंड । व्याली माय ते लाजविली रांड । नाहीं थार दो ठायीं जाला खंड वो ॥धृ ॥ होतें तैसें तें उमटलें वरी । बाह्य संपादणी अंतरींची चोरी । नाहीं मर्यादा निःसंग बावरी । मन हें गोविंदीं देह काम करी वो ॥2॥ नाहीं करीत उत्तर कोणासवें । पराधीन भोजन दिलें खावें । नाहीं अचळ सावरावा ठावे । देखों उदासीन तुज देहभावें वो ॥3॥ कोठें नेणों हा फावला एकांत । सदा किलकिल भोंवतीं बहुत । दोघे एकवाटा बोलावया मात । नाहीं लाज धरिली दिला हात वो ॥4॥ करी कवतुक खेळ खेळे कान्हा । दावी लाघव भांडवी सासासुना । परा भिH हे शुद्ध तुह्मी जाणा । तुका ह्मणें ऐसें कळों यावें जना वो ॥5॥ 379 भरिला उलंडूनि रिता करी घट । मीस पाणियाचें गोविंदाची चट । चाले झडझडां उसंतूनि वाट । पाहे पाळतूनि उभा तो चि नीट वो ॥1॥ चाळा लावियेले गोप गोपीनाथें । जाणे आवडीचें रूप जेथें तेथें । दावी बहुतांच्या बहुवेषपंथें । गुणातीतें खेळ मांडियेला येथें वो ॥ध्रु.॥ मनीं आवडे तें करावें उत्तर । कांहीं निमित्ताचा पाहोनि आधार । उगा राहे कां मारिसी कंकर । मात वाढविसी उत्तरा उत्तर वो ॥2॥ धरिली खोडी दे टाकोनियां मागें । न ये विनोद हा कामा मशीं संगें । मिठी घालीन या जीवाचिया त्यागें । नाहीं ठाउकी पडिलीं तुझीं सोंगें रें ॥3॥ सुख अंतरींचें बाहए ठसठसी । ह्मणे विनोद हा काय सोंग यासी । तुज मज काय सोयरीक ऐसी । नंदानंदन या थोरपणें जासी रे ॥4॥ करी कारण तें कळों नेदी कोणा । सुख अंतरींचे बाहए रंग जाना । मन मिनलें रे तुका ह्मणे मना । भोग अंतरींचा पावे नारायणा वो ॥5॥ 380 आजि नवल मी आलें येणे राणें । भेटी अवचिती नंदाचिया कान्हें । गोवी सांगती वो सकळ ही जन । होतें संचित आणियेलें तेणें वो ॥1॥ गेलें होउनि न चले आतां कांहीं । साद घालितां जवळी दुजें नाहीं । अंगीं जडला मग उरलें तें काइऩ । आतां राखतां गुमान भलें बाइऩ वो ॥ध्रु.॥ बहुत कामें मज नाहीं आराणूक। एक सारितां तों पुढें उभें एक । आजि मी टाकोनि आलें सकिळक। तंव रचिलें आणिक कवतुक वो ॥2॥ चिंता करितां हरिली नारायणें। अंगसंगें मिनतां दोघेजणें । सुखें निर्भर जालियें त्याच्या गुणें । तुका ह्मणे खुंटलें येणें जाणें वो ॥3॥ 381 मैं भुली घरजानी बाट । गोरस बेचन आयें हाट ॥1॥ कान्हा रे मनमोहन लाल । सब ही बिसरूं देखें गोपाल ॥ध्रु.॥ काहां पग डारूं देख आनेरा । देखें तों सब वोहिन घेरा ॥2॥ हुं तों थकित भैर तुका । भागा रे सब मनका धोका ॥3॥ 382 हरिबिन रहियां न जाये जिहिरा । कबकी थाडी देखें राहा ॥1॥ क्या मेरे लाल कवन चुकी भइऩ । क्या मोहिपासिती बेर लगाइऩ ॥ध्रु.॥ कोइऩ सखी हरी जावे बुलावन । बार हि डारूं उसपर तन ॥2॥ तुका प्रभु कब देखें पाऊं । पासीं आऊं फेर न जाऊं ॥3॥ 383 भलो नंदाजीको डिकरो । लाज राखीलीन हमारो ॥1॥ आगळ आवो देवजी कान्हा । मैं घरछोडी आहे ह्मांना ॥ध्रु.॥ उन्हसुं कळना वेतो भला । खसम अहंकार दादुला ॥2॥ तुका प्रभु परवली हरी ।छपी आहे हुं जगाथी न्यारी ॥3॥ 384 नका कांहीं उपचार माझ्या शरीरा । करूं न साहती बहु होतो उबारा । मनोजन्य व्यथा वेध जाला अंतरा । लवकरी आणा नंदाचिया कुमरा ॥1॥ सखिया वेशिया तुह्मी प्राणवल्लभा । निवेदिला भाव आर्तभूत या लोभा । उमटली अंगीं वो सांवळी प्रभा । साच हे अवस्था कळे मज माझ्या क्षोभा ॥ध्रु.॥ नये कळों नेदावी हे दुजियासि मात । घडावा तयासि उत्कंठा एकांत । एकाएकीं साक्षी येथें आपुलें चित्त । कोण्या काळें होइल नेणों भाग्य उदित वो ॥2॥ स्वाद सीण देहभान निद्रा खंडन । पाहिले तटस्थ उन्मिळत लोचन । अवघें वोसाऊन उरले ते चरण । तुका ह्मणे दर्शनापें आलें जीवन ॥3॥ 385 पडिली भुली धांवतें सैराट । छंद गोविंदाचा चोजवितें वाट । मागें सांडोनि सकळ बोभाट । वंदीं पदांबुजें ठेवुनि ललाट वो ॥1॥ कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी । होतें वहिलें लपाला आतां खांदीं । कोठें आड आली हे देहबुद्धी । धांवा आळवीं करुणा कृपानिधी वो ॥ध्रु.॥ मागें बहुतांचा अंतरला संग । मुळें जयाचिया तेणें केला त्याग । पहिलें पाहातां तें हरपलें अंग । खुंटली वाट नाहींसें जालें जग वो ॥2॥ शोकें वियोग घडला सकळांचा । गेल्या शरण हा अन्याय आमुचा । केला उच्चार रे घडल्या दोषांचा। जाला प्रगट स्वामी तुकयाचा वो ॥3॥ 386 काय उणें कां करिशील चोरी । किती सांगों तुज नाइकसी हरी । परपरता तूं पळोनि जासी दुरी । अनावर या लौकिका बाहेरी वो ॥1॥ माया करुणा हे करिते बहुत । किती सोसूं या जनांचे आघात । न पुरे अवसरु हें चि नित्यानित्य । तूं चि सोडवीं करूनि िस्थर चित्त ॥ध्रु.॥ बहुत कामें मी गुंतलियें घरीं । जासी डोळा तूं चुकावूनि हरी । करितां लाग न येसी च पळभरी । नाहीं सायासाची उरों दिली उरी वो ॥2॥ तुज ह्मणीयें मी न संगें अनंता । नको जाऊं या डोिळयां परता । न लगे जोडी हे तुजविण आतां । तुकयास्वामी कान्होबा गुणभरिता वो ॥3॥ 387 घाली कवाड टळली वाड राती । कामें व्यापिलीं कां पडिली दुिश्चत्ती । कोणे लागला गे सदैवेचे हातीं । आजि शून्य शेजे नाहीं दिसे पती वो ॥1॥ बोले दूतिकेशीं राधा हें वचन । मशीं लाघव दाखवी नारायण । ह्मणे कोमळ परी बहु गे निर्गुण । याशीं न बोलें कळला मज पूर्ण वो ॥ध्रु.॥ धाडिलें गरुडा आणिलें हनुमंता। तैं पाचारिलें होउनि ये वो सीता । लाजिनली रूप न ये पालटितां । जाला भीमकी आपण राम सीता वो ॥2॥ सत्यभामा दान करी नारदासी । तैं कळला वो मज हृषीकेशी । तुळे घालितां न ये कनक वो रासी । सम तुके एक पान तुळसी वो ॥3॥ मज भुली पडली कैशापरी । आह्मां भोगूनि ह्मणे मी ब्रह्मचारी । दिली वाट यमुने मायें खरी । तुह्मां आह्मां न कळे अद्यापवरी वो ॥4॥ जाणे जीवींचें सकळ नारायण । असे व्यापूनि तो न दिसे लपून । राधा संबोखिली प्रीती आलिंगून । तुका ह्मणे येथें भाव चि कारण वो ॥5॥ 388 मिळोनि गौळणी देती यशोदे गा†हाणीं । दहिं दुध तुप [[लोणी]]ं शिंकां नुरे कांहीं । मेळवुनी पोरें तेथें रिघे एकसरें । वेगीं आणोनी सामोरें तेथें लोणी खाय ॥1॥ हरि सोंकला वो हरि सोंकला वो । सोंकला तो वारीं तुज लाज नाहीं तरी । आम्हां सांपडतां उरी तुज मज नाहीं ॥ध्रु.॥ तुज वाटतसे कोड यासि लागतसे गोड । काय हासतेसी वेड तुज लागलें वो । आह्मी जाऊं तुजवरी पोरें चाळविल्या पोरी । काय सांगों भांडखोरी लाज वाटे आह्मां ॥2॥ मुख मिळण वदन उभा हाडतिये घोणे । तंव दसवंती ह्मणे आणा शीक लावूं । थोर आणिला कांटाळा घरीं दारीं लोकपाळां। डेरा रिघोनी गुसळा तेथें लोणी खाय ॥3॥ मिळोनि सकळा दावें लावूनियां गळां । कैशा बांधिती उखळा येथें राहे उगा । बरा सांपडलासी हरी आजिच्यानें करिसिल चोरी । डोळे घालुनियां येरी येरीकडे हांसे ॥4॥ फांकल्या सकळा उपडूनियां उखळा । मोडी वृक्ष विमळार्जुन दोन्ही । उठिला गजर दसवंती नव्हे धीर । धांवे तुकयाचा दातार आळंगिला वेगीं ॥5॥ 389 गोरस घेउनी सातें निघाल्या गौळणी । तंव ती कृष्णाची करणी काय करी तेथें । जाला पानसरा मिठी घातली पदरा । आधीं दान माझें सारा मग चाला पंथें ॥1॥ सर जाऊं दे परता । मुळीं भेटलासी आतां । नाट लागलें संचिता । खेपा खुंटलिया ॥ध्रु.॥ आसुडी पदरा धरी आणीक दुसरा । येरी झोंबतील करा काय वेडा होसी । आलों गेलों बहु वेळां नेणों गोरा कीं सांवळा । सर परता गोवळा काय बोलतोसी ॥2॥ आह्मी येथें अधिकारी मागें केली तुह्मी चोरी । आतां कळलियावरी मागें केलें त्याचें । बोलिल्या हांसुनी आह्मी सासुरवासिनी । कां रे झोंबसी दुरूनी करी मात कांहीं ॥3॥ वांयां परनारी कैशा धरिसी पदरीं । तयां कळलिया उरी तुज मज नाहीं । जडला जिव्हारीं फांकों नेदी तया नारी । जेथें वर्म तें धरी जाऊं पाहे तियेचें ॥4॥ तया हाती सांपडल्या हाटीं पाटीं चुकाविल्या। कृष्णमिळणीं मिळाल्या त्याही न फिरती । तुका ह्मणे खंती वांयां न धरावी चित्तीं । होतें तुमच्या संचितीं वोडवलें आजि ॥5॥ 390 हरी तुझी कांति रे सांवळी । मी रे गोरी चांपेकळी । तुझ्या दर्शनें होइऩन काळी । मग हें वाळी जन मज ॥1॥ उगला राहें न करीं चाळा । तुज किती सांगों रे गोवळा । तुझा खडबड कांबळा। अरे नंदबाळा आलगटा ॥ध्रु.॥ तुझिये अंगीं घुरट घाणी। बहु खासी दुध तुप लोणी । घरिचें बाहेरिल आणोनी । मी रे चांदणी सकुमार ॥2॥ मज ते हांसतील जन । धिःकारिती मज देखोन । अंगीं तुझें देखोनि लक्षण । मग विटंबणा होइल रे ॥3॥ तुज लाज भय शंका नाहीं । मज तंव सज्जन पिशुन व्याही । आणीक मात बोलूं काहीं । मसी भीड नाहीं तुज माझी ॥4॥ वचन मोडी नेदी हात । कळलें न साहे ची मात । तुकयास्वामी गोपीनाथ । जीवन्मुH करूनि भोगी ॥5॥ 391 सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गा†हाणें देती कैसें । काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें। दहिं दुध लोणी शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें । चाळवूनि नाशिली कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥1॥ आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी । मिळोनि सकळै जणी करूं वाखा सखीं तुज मज होइऩल तुटी गे बाइये ॥ध्रु.॥ नेणे आपपर लौकिक वेव्हार भलते ठायीं भलतें करी । पाळतुनि घरीं आह्मी नसतां तेथें आपण संचार करी। सोगया चुंबन देतो आलिंगन लोळे मेजाबाजावरी । शिंकीं कडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाइये ॥2॥ आतां याची चाड नाहीं आह्मां भीड सांपतां कोड पुरवूं मनिचें । सोसिलें बहु दिस नव्हता केला निस ह्मणुनि एकुलतें तुमचें । चरण खांबीं जीवें बांधैन सरिसा जवें न चले कांहीं याचें । अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा भलतें हो या जिवाचें गे बाइये ॥3॥ घेउनी जननी हातीं चक्रपाणी देतिसे गौळणी वेळोवेळां । निष्ठ‍ वाद झणीं बोलाल सकळा क्षोभ जाइल माझ्या बाळा । जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा । देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥4॥ 392 विरहतापें काुंफ्दे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुिश्चती । न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती ॥1॥ खुंटलीसी जाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण नेणें भोंवती । त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥ध्रु.॥ बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना जाला तेणें संचार । विसरूनि गेली सासुरें की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येथें सर्वथा बळा । त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा ॥3॥ 393 ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें । कळों नेदी माया त्याचें त्यास ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥1॥ अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया त्या वाहाती संकल्प मना । काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेवोनियां राणा ॥ध्रु.॥ अवघियांचा जाणें जाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें तया भीतरी । कळों नेदी घरिच्या करी गोवूनी चोरी । हातोहातीं नेती परपरत्या दुरी ॥2॥ आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें पारिखें जन । एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका ह्मणे एका नारायणा वांचून ॥3॥ 394 खेळतां मुरारी जाय सरोवरा तिरीं । तंव नग्न चि या नारी तेथें देखियेल्या । मांडिले विंदान ख्याल सुखाचें संधान । अंग लपवूनी मान पिलंगत चाले ॥1॥ ख्याल मांडिला रे ख्याल मांडिला रे । पायां पडतां रे न सोडी नेदी साउलां रे ॥ध्रु.॥ साडएा साउलीं पातळें गोंडे कसणिया चोऑया । बुंथी घेउनी सकळा कळंबावरी पळे। खांदी धरूनियां करीं दृष्टी घालोनि सामोरी । बैसे पाला वोढी वरी खदखदां हांसे ॥2॥ आनंदें कल्लोळ बाळा खेळती सकळ देती उलटिया चपळ । एकी एकीहूनि ह्मैस वेल सुर काडी । एकी उगविती कोडीं । नाना परीच्या निकडी खेळ मांडियेला ॥3॥ एकी आलिया बाहेरी पाहे लुगडें तंव नारी । ह्मणे नाहीं नेलें चोरी काय जाणों केव्हां। केला सकळी हाकारा तंव आलिया बाहेरा । आतां ह्मणतील घरां जावें कैशा परी ॥4॥ तंव हांसे वनमाळी वरी पाहोनी सकळी । लाजे रिघालिया जळीं मागें पुढें हात । लाज राखावी गोपाळा आह्मांजणींची सकळां । काय मागसी ये वेळा देऊं गुळवाटी ॥5॥ जोडोनियां कर या गे सकळी समोर । वांयां न बोलावें फार बडबड कांहीं । भातुकें भूषण नाहीं चाड नेघें धन । करा एक चित्त मन या गे मजपाशीं ॥6॥ एक एकीकडे पाहे लाज सांडूनियां राहे। ह्मणे चला आतां सये जाऊं तयापाशीं । जोडोनियां हात कैशा राहिल्या निवांत । तुका ह्मणे केली मात लाज राखिली तयांची ॥7॥ 395 धरिला पालव न सोडी माझा येणें । कांहीं करितां या नंदाचिया कान्हें । एकली न येतें मी ऐसें काय जाणें । कोठें भरलें अवघड या राणें रे ॥1॥ सोडी पालव जाऊ दे मज हरी । वेळ लागला रे कोपतील घरीं । सासू दारुण सासरा आहे भारी । तुज मज सांगतां नाहीं उरी रे ॥ध्रु.॥ सखिया वेशिया होतिया । तुज फावलें रे फांकतां तयांसी । होतें अंतर तर सांपडतें कैसी । एकाएकीं अंगीं जडलासी रे ॥2॥ कैसी भागली हे करितां उत्तर । शिH मावळल्या आसुडितां कर । स्वामी तुकयाचा भोगिया चतुर। भोग भोगी त्यांचा राखे लोकाचार वो ॥3॥ 396 गाइऩ गोपाळ यमुनेचे तटीं । येती पाणिया मिळोनि जगजेटी । चेंडू चौगुणा खेळती वाळवंटीं । चला चला ह्मणती पाहूं दृष्टी वो ॥1॥ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी । चित्त विव्हळ देखावया हरी । मिस पाणियाचें करितील घरीं । बारा सोळा मिळोनि परस्परीं वो ॥ध्रु.॥ चिरें चोिळया त्या धुतां विसरती । ऊर्ध्व लक्ष लागलें कृष्णमूर्ती । कोणा नाठवे कोण कुळ याती । जालीं ताटस्त सकळ नेत्रपातीं वो ॥2॥ दंतधावनाचा मुखामाजी हात । वाद्यें वाजती नाइके जनमात । करी श्रवण कृष्णवेणुगीत । स्वामी तुकयाचा पुरवील मनोरथ वो ॥3॥ 397 कोठें मी तुझा धरूं गेलें संग । लावियेलें जग माझ्या पाठीं ॥1॥ सर सर रे परता अवगुणाच्या गोवळा । नको लावूं चाळा खोटा येथें ॥ध्रु.॥ रूपाच्या लावण्यें नेली चित्तवृत्ती । न देखें भोंवतीं मी ते माझी ॥2॥ तुकयाचा स्वामी माझे जीवीं च बैसला। बोलीं च अबोला करूनियां ॥3॥ 398 गोड लागे परी सांगतां चि न ये । बैसे मिठी सये आवडीची ॥1॥ वेधलें वो येणें श्रीरंगरंगें । मीमाजी अंगें हारपलीं ॥ध्रु.॥ परते चि ना दृष्टी बैसली ते ठायीं । विसावोनि पायीं ठेलें मन ॥2॥ तुकयाच्या स्वामीसवें जाली भेटी । तेव्हां जाली तुटी मागिल्यांची ॥3॥ 399 पाहावया माजी नभा । दिसे शोभा चांगली ॥1॥ बैसला तो माझे मनीं । नका कोणी लाजवूं ॥ध्रु.॥ जीवा आवडे जीवाहूनि । नव्हे क्षण वेगळा ॥2॥ जालें विश्वंभरा ऐसी । तुकया दासी स्वामीची ॥3॥ 400 कोणी एकी भुलली नारी । विकितां गोरस ह्मणे घ्या हरी ॥1॥ देखिला डोळां बैसला मनीं । तो वदनीं उच्चारी ॥ध्रु.॥ आपुलियाचा विसर भोळा । गोविंद कळा कौतुकें ॥2॥ तुका ह्मणे हांसे जन । नाहीं कान ते ठायीं ॥3॥ 401 करूनी आइत सत्यभामा मंदिरीं रे । वाट पाहे टळोनि गेली रात्री रे । न ये चि देव येतील कामलहरी रे । पडिली दुिश्चती तंव तो कवाड टिमकारी रे ॥1॥ सर गा परता कळला तुझा भाव रे । कार्या पुरतें हें दाविसी लाघव रे । बोलतोसी तें अवघी तुझी माव रे । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥ध्रु.॥ मी च वेडी तुजला बोल नाहीं रे । दानावेळे विटंबणा जाली काय रे । मागुती रुद्रासि भेटी दिली तइप रे । विश्वास तो तुझ्या बोला आझुनि तरी रे ॥2॥ भ्रम होता तो अवघा कळों आला रे । मानवत होतें मी भला भला रे । नष्टा क्रिया नाहीं मां तुझ्या बोला रे । तुकयाबंधु स्वामी कानडएा कौसाल्या रे ॥3॥ 402 तंव तो हरि ह्मणे वो निजांगने वो । लाइ नीच कां देसील डोहणे वो । मजपें दुजें आलें तें देव जाणे वो । शब्द काय हे बोलसी ते उणे वो ॥1॥ पाहा मनीं विचारुनी आधि वो । सांडूनि देइप भ्रांति करीं िस्थर बुिद्ध वो । तंट केलें हें माझें तुझें उपाधीं वो । उघडी डोळे आझुनि तरी धरीं शुिद्ध वो ॥ध्रु.॥ कोठें तरी दुनियांत वर्तलें वो । िस्त्रयांनीं भ्रतारा दानां दिलें वो । कैसा भला मी नव्हे तें सोसिलें वो । रुसतेसी तूं उफराटें नवल जालें वो ॥2॥ काय सांग म्यां दैन्य केली कैसी वो । तुझ्या गर्वें आणविलें हनुमंतासि वो । कष्टी केलें मज गरुडा भीमकीसि वो । तुकयाबंधु ह्मणे खरें खोटें नव्हे यासि वो ॥3॥ 403 तंव ते ह्मणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुह्मी ह्मणां आपणांसि वो । तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाटए बरें संपादूं जाणतोसि वो ॥1॥ सर हो परता परता हो आतां हरी । ह्मणे सत्राजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी ॥ध्रु.॥ भावें गेलें ह्मुण न व्हावा वियोग। मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग । तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें हे तुझे रंग ॥2॥ काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें । नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में। परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें ॥3॥ काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी निष्ठ‍ ऐसा निर्गुण । आप पर न ह्मणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण ॥4॥ इतुकियावरी ह्मणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना । आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भHवत्सल ह्मणे तुकयाबंधु कान्हा ॥5॥ 404 कान्हो एकली रे एकली रे । तुजसवें चुकलें रे । भय वाटे वनीं मज अबळा धाकली रे ॥1॥ निघतां घरीं आइऩ बा वारी। तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥ लोक वाटा सांगती खोटा । परी मी चटा लागलियें ॥2॥ पिकल्या बोरी जालें सामोरी । काय जाणें कोठें राहिला हरी ॥3॥ आड खुंट जालिया जाळी । काय जाणों कान्हें मांडिली रळी ॥4॥ तुका ह्मणे जाऊं आलिया वाटा । पाहों हरी पायीं न मोडे कांटा ॥5॥ 405 क्याला मज आयो वारितेसी घरा । खेळतों सोकरा नंदाचा मी ॥1॥ बहु दिसीं जाली यासीं मज भेटी । आतां वाटे तुटी न परावी ॥ध्रु.॥ कोवळें बोलतो मना आवरतें । डोिळयाचें पातें ढापवेना ॥2॥ आजि सकळांसी आलें चोलुनियां । कां गो पाठी वांयां पुलविली ॥3॥ तुमचें तें काय खोळंबलें काज । बल्या कां गो मज कोंडा घरीं ॥4॥ तुकयाचा धनी गोकुळनायक । सरा कांहीं एक बोलतों मी ॥5॥ 406 आता न यें मागें । मी आलें याच्या रागें । काय माझें जगें । कोपोनियां करावें ॥1॥ कां गो कलित्यां कोल्हाल । तुह्मी भलत्या च सकल । वेचाल ते बोल । झुटे होती बोलिले ॥ध्रु.॥ याचे भेटी माझें मन । स्वरुपीं ठाकले लोचन । वेगळें तें क्षण आतां होऊं नावरे ॥2॥ काज काम नको जालें । बीजें नावरे बोलिलें । याचिया भेदिलें। कामबाणीं अंतर ॥3॥ या वेगळें होणें । आतां जळो तैसें जिणें । घेतलें तें मनें । आतां मागें न फिरे ॥4॥ आतां मोटी वार। माझी नका धरूं चार । तुकयाचा दातार । शेजे तो मी सुतलों ॥5॥ 407 हरिरता चपळा नारी । लागवरी न रिघती ॥1॥ अवघ्या अंगें सवाौत्तम । भोगी काम भोगता ॥ध्रु.॥ वाचा वाच्यत्वासि न ये । कोठें काय करावें ॥2॥ तुका ह्मणे देवा ऐशा । देवपिशा उदारा ॥3॥ 408 गौळणी आल्या वाज । ह्मणती या गे राखों आज । सांपडवुनी माजघरांत धरुनी कोंडूं । उघडें कवाड उभ्या काळोशाचे आड । साता पांचा एक भीड मौनेंची ठेल्या ॥1॥ नित्य सोंकवला नेदी । सांगों चित्त बोला । आतां सांपडतां याला कोण सोडी जीवें ॥ध्रु.॥ जाणोनियां हरी त्याच घरा आला चोरी । गडियां ठेवुनी बाहेरी पूर्वद्वारें शिरे । त्यांच्या भयाभीत चाले पिलंगत भोंवतालें । पाहे तंव देखियेलें नवनीत पुढें ॥2॥ उतरोनि सिंकें । पाहे चाखोनियां निकें। गोड तें चि एका एकें । हातीं लांबवितो । जाणे राखती तयांसि । तेथें अधिक चि नासी । माग लावी हात पुसी । चोरी जाणावया ॥3॥ जाणोनियां नारी । मूळ वर्मद्वार धरी । माजे कोंडूनी भीतरी । घरांत धरीयेला । कां रे नागविसी । माझे मुळीं लागलासी । आणवीन तुजपासीं । मागें खादलें तें ॥4॥ दोही संदी बाहे । धरूनि नेती माते पाहे । काय नासी केली आहे । घरामाजी येणें । तुका ह्मणे मुख । त्याचें वाढों नेदी दुःख । दसवंती कवतुक। करुनी रंजविल्या ॥3॥ 409 आलियें धांवति धांवति भेट होइल ह्मुण । तंव ते टळली वेळ वो माझा उरला सीण ॥1॥ आतां काय करूं सांग वो मज भेटेल कैसा । हरिलागीं प्राण फुटे वो थोरी लागली आशा ॥ध्रु.॥ लाविला उशीर बहुतीं बहु ओढिती ओढा । सांभािळतां सांग असांग दुःख पावल्यें पीडा ॥2॥ जळो आतां संसारु वो कइप शेवट पुरे । तुकयाच्या स्वामी गोपाळालागीं जीव झुरे ॥3॥ 410 आणीक काय थोडीं । परि तें फार खोटीं कुडीं ॥1॥ सदा मोकळीं च गुरें । होती फजीत तीं पोरें ॥ध्रु.॥ सदा घालिता हुंबरी। एक एकांचे न करी ॥2॥ तुका ह्मणे घरीं माय वेळोवेळां मारी ॥3॥ 411 बहुतांचे संगती । बहु पावलों फजिती ॥1॥ बरें केलें नंदबाळें । मागिलांचें तोंड काळें ॥ध्रु.॥ माझा करितील तंटा । लपती आलिया बोभाटा ॥2॥ तुका ह्मणी काइऩ । किती ह्मणों बाप आइऩ ॥3॥ 412 गाइऩन ते लीळा चरित्र पवाडे । राखिले संवगडे सहित गाइऩ ॥1॥ चोरिलें नवनीत बांधविला गळा । जे तुह्मीं गोपाळा छंद केले ॥ध्रु.॥ मोहिल्या गोपिका पांवयाच्या छंदें । केली ते गोविंदें क्रीडा गाऊं ॥2॥ मायबापा लाड दाखविलें कौतुक । तें या आणूं सुख अंतरासी ॥3॥ निदाऩिळले दुष्ट भHां प्रतिपाळी । ऐसा ह्मणों बळी आमुचा स्वामी ॥4॥ तुका ह्मणे सरसी असों येणें वोघें । लागोनि संबंधें सर्वकाळ ॥5॥ डांका - अभंग 8 413 चौक भरियेला आसनीं पाचारिली कुळस्वामिनी । वैकुंठवासिनि ये धांवोनी झडकरी ॥1॥ रंगा येइप वो विठाइऩ सांविळये डोळसे । तुझें श्रीमुख साजिरें तें मी केधवां देखेन ॥ध्रु.॥ रजतमधुपारती। पंचप्राणांची आरती । अवघी सारोनी आइती । ये धांवती झडकरी ॥2॥ मन मारोनियां मेंढा । आशा मनसा तृष्णा सुटी । भिHभाव नैवेद्य ताटीं । भरोनि केला हाकारा ॥3॥ डांका अनुहात गजरे । येउनि अंगासी संचरे । आपुला घेउनी पुरस्कार । आरोग्य करीं तुकयासी ॥4॥ 414 साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनति सांगतों ॥1॥ माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥ तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । चिवडुनियां नासी। तुझ्या घरिच्यांनीं केली ॥2॥ आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥3॥ आंधऑयासी डोळे। देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र फळे । नवस पुरविते विठाइऩ ॥4॥ उगविलीं कोडीं । मागें कितेकांचीं बापुडीं । तुका ह्मणे घडी। न लगे नवस द्या आधीं ॥5॥ 415 विनति घातली अवधारीं । मज देइप वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥1॥ रंगा येइप वो एकला रंग वोडवला । हरिनाम उठिला गजर केला हाकारा ॥ध्रु.॥ देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवति ॥2॥ न लवीं आतां वेळ । आइत सारिली सकळ । तुका ह्मणे कुळ । आमुचिये दैवते ॥3॥ 416 माझा देव्हारा साचा । नाहीं आणीक कोणाचा । त्रिभुवनीं याचा । ठसा न लगे पुसावें ॥1॥ या रे लोटांगणीं । कांहीं करा विनवणी। करील झाडणी । भूत काढी संसार ॥ध्रु.॥ पडिले विषयांचे गोंधळीं । ते त्रिगुण आकळी । हरिनाम आरोळी । कानीं पडतां ते उठी ॥2॥ घेतला अहंकार । काम क्रोध या मत्सरें । पळती प्रेमभरें। अवघे ठाव सांडुनी ॥3॥ घेतलासे पुरा । माया ममता आसरा । अवघ्या एक सरा । पळती रंग देखोनी ॥4॥ तुका ह्मणे द्यावा भाव । फिटेल मनिचा संदेह । आणीक न लगे ठाव । कांहीं कोठें हिंडावें ॥5॥ 417 पुढें येते देवी । तिची जती चालों द्यावी । मागील झाडावी । झाडा मान आसडी ॥1॥ एकवीरा आली अंगा । आतां निवारील रोगा । माझ्या भHापाशीं सांगा । पूजा भावें करावी ॥ध्रु.॥ मेंढा मारावा लोवाळ । पूजा पावली सकळ । तुह्मीं केलें बळ । मग मी ठायीं न पडें ॥2॥ तुका ह्मणें मुळीं । लागली ते आली कुळीं । वंदुनी सकळीं । जीवें भावों ओवाळा ॥3॥ 418 अवघ्या जेष्ठादेवी कोण पूजनाचा ठाव । धरितां चि भाव कोठें नाहींसें जालें ॥1॥ दिसे सारिखें सारिखें । परि तें कारणीं पारिखें । तळीं गेलें देखें । वरी टोले न साहाती ॥ध्रु.॥ पट एका शिरीं । यथाविधीनें त्या येरी । बसकोऑया घागरी डेरे रांझण गाडगीं ॥2॥ तुका ह्मणे माना । येथें कोणीं रुसावें ना । आपुलाल्या स्थानां । जेथें त्या चि शोभल्या ॥3॥ 419 खेचर खडतर । काळ कांपती असुर । नांदे भीमातीर। पंढरपुर पाटणीं ॥1॥ आतां करी कां रे हाकारा । सहस्र नामें एकसरा । दवडिते खेचरा । अंगसंगें धरूनी ॥ध्रु.॥ सीते जाली झडपणी । राहाणे वासुगीच्या बनीं । पावली जननी । झोंटि मोकिळया केशी ॥2॥ लाविलें कावरें । प्रल्हादा ह्मैसासुरें । आली येकसरें । दांत खात रंगासी ॥3॥ वसुदेवाचीं बाळें । सात खादलीं ज्या काळें। आली भोगवेळे । तया कारणें तेथें ॥4॥ पांडवें बापुडीं । वाज केलीं फिरती वेडीं । धांवोनियां काढी । अंगसंगें त्राहाविलीं ॥5॥ नामाचें चिंतन । तेथें धांवते आपण । न विचारितां हीण । भाव देखे जयाचा ॥6॥ कुळीची कुळदेवता । तुका ह्मणे आह्मां माता । काय भय भूतां । काळ यमदूताचें ॥7॥ 420 देवी देव जाला भोग सरला यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥1॥ हरिनाम देवनाम तुह्मी गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥ शेवटीं सुताळी बरवी वाजवावी डांक । ताळा घाली एक सरलियाचे शेवटीं ॥2॥ गुंडाळा देव्हारा मान देती मानकरी । तुका ह्मणे बरीं आजि कोडीं उगविलीं ॥3॥ ॥8॥ 421 जाली झडपणी खडतर देवता । संचरली आतां निघों नये ॥1॥ मज उपचार झणी उपचार झणी आतां करा । न साहे दुसरा भार कांहीं ॥ध्रु.॥ नेऊनियां घाला चंद्रभागे तिरीं । जीवा नाहीं उरी कांहीं आतां ॥2॥ तुका ह्मणे कळों आलें वर्तमान । माझें तों वचन आच्छादलें ॥3॥ 422 अंगीं देवी खेळे । कां रे तुह्मासी न कळे । कोणाचे हे चाळे सुख दुःख न मनितां ॥1॥ मीं तों आतां येथें नाहीं । ओळखी वचनाच्या ठायीं । पालटाचा घेइप । भाव खरें लोपे ना ॥ध्रु.॥ आपुलाले तुह्मी पुसा । सोवा एव्याच सरिसा । थिरावल्या कैसा काय जाणों विचार ॥2॥ तुका ह्मणे लाभकाळ । तेथें नसावें शीतळ । मग तैशी वेळ । कोठें जाते सांपडों ॥3॥ 423 पांगुळ जालों देवा नाहीं हात ना पाय । बैसलों जयावरी सैराट तें जाय । खेटितां कुंप कांटी । खुंट दरडी न पाहे। आधार नाहीं मज कोणी । बाप ना माये ॥1॥ दाते हो दान करा। जातें पंढरपुरा । न्या मज तेथवरी । अखमाचा सोयरा ॥ध्रु.॥ हिंडतां गव्हानें गा । शिणलों दारोदारीं । न मिळे चि दाता कोणी जन्मदुःखातें वारी । कीतिऩ हे संतां मुखीं । तो चि दाखवा हरी । पांगळां पाय देतो । नांदे पंढरपुरीं ॥2॥ या पोटाकारणें गा । जालों पांगीला जना । न सरे चि बापमाय भीक नाहीं खंडणा । पुढारा ह्मणती एक । तया नाहीं करुणा । श्वान हें लागे पाठीं । आशा बहु दारुणा ॥3॥ काय मी चुकलों गा मागें नेणवे कांहीं । न कळे चि पाप पुण्य । तेथें आठव नाहीं मी माजी भुललों गा । दीप पतंगासोयी । द्या मज जीवदान । संत महानुभाव कांहीं ॥4॥ दुरोनि आलों मी गा । दुःख जालें दारुण । यावया येथवरी होतें हें चि कारण । दुर्लभ भेटी तुह्मां । पायीं जालें दरुषन । विनवितो तुका संतां । दोन्ही कर जोडून ॥5॥ 424 देश वेष नव्हे माझा । सहज फिरत आलों । करूं सत्ता कवणावरी कोठें िस्थर राहिलों । पाय डोळे ह्मणतां माझे । तींहीं कैसा मोकलिलों । परदेशीं नाहीं कोणी । अंध पांगुळ जालों ॥1॥ आतां माझी करीं चिंता । दान देइप भगवंता । पाठीं पोटीं नाहीं कोणी । निरवीं सज्जन संता ॥ध्रु.॥ चालतां वाट पुढें । भय वाटतें चित्तीं । बहुत जन गेलीं नाहीं आलीं मागुतीं । न देखें काय जालें। कान तरी ऐकती । बैसलों संधिभागीं । तुज धरूनि चित्तीं ॥2॥ भाकितों करुणा गा । जैसा सांडिला ठाव । न भरें पोट कधीं नाहीं निश्चळ पाव । हिंडतां भागलों गा । लक्ष चौ†याशी गांव । धरूनि राहिलों गा । हा चि वसता ठाव ॥3॥ भरवसा काय आतां । कोण आणि अवचिता । तैसी च जाली कीतिऩ । तया मज बहुतां । ह्मणउनि मारीं हाका । सोयी पावें पुण्यवंता । लागली भूक थोरी । तूं चि कृपाळू दाता ॥4॥ संचित सांडवलें । कांहीं होतें जवळीं । वित्त गोत पुत माया । तुटली हे लागावळी । निष्काम जालों देवा। होतें माझे कपाळीं । तुका ह्मणे तूं चि आतां । माझा सर्वस्वें बळी ॥5॥ 425 देखत होतों आधीं मागें पुढें सकळ । मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ । तिमिर कोंदलेंसें वाढे वाढतां प्रबळ । भीत मी जालों देवा । काय ज्याल्याचें फळ ॥1॥ आतां मज दृष्टी देइप । पांडुरंगा मायबापा । शरण आलों आतां । निवारूनियां पापा । अंजन लेववुनी। करीं मारग सोपा । जाइऩन सिद्धपंथें । अवघ्या चुकती खेपा ॥ध्रु.॥ होतसे खेद चित्ता । कांहीं नाठवे विचार । जात होतों जना मागें तोही सांडिला आधार । हा ना तोसा ठाव जाला। अवघा पडिला अंधार । फिरलीं माझीं मज । कोणी न देती आधार ॥2॥ जोंवरि चळण गा । तोंवरि ह्मणती माझा । मानिती लहान थोर देहसुखाच्या काजा । इंिद्रयें मावळलीं । आला बागुल आजा। कैसा विपरीत जाला। तो चि देह नव्हे दुजा ॥3॥ गुंतलों या संसारें। कैसा झालोंसें अंध। मी माझें वाढवुनी मायातृष्णेचा बाध। स्वहित न दिसे चि । केला आपुला वध । लागले काळ पाठीं । सवें काम हे क्रोध ॥4॥ लागती चालतां गा । गुणदोषाच्या ठेंसा । सांडिली वाट मग जालों निराळा कैसा । पाहातों वास तुझी । थोरी करूनी आशा । तुका ह्मणे वैद्यराजा। पंढरीच्या निवासा ॥5॥ 426 सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृित्त हे निवृित्त जाली जन न दिसे तेथें । मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें। अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥1॥ सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥ टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा । न मागें मी भीक आतां हा चि जाला भरवसा। वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥2॥ ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद । घेऊनि आला दान निजतkव निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥3॥ शब्द हा बहुसार उपकाराची राशी । ह्मणोनि चालविला मागें येतील त्यांसीं । मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥4॥ वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ठाव । ह्मणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका ह्मणे हा चि संतीं मागें केला उपाव ॥5॥ 427 आंधऑयापांगऑयांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तो चि सर्व होय जाणता । घडी मोडी हेळामात्रें पापपुण्यसंचिता। भवदुःख कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥1॥ धर्म गा जागो तुझा तूं चि कृपाळू राजा । जाणसी जीवींचें गा न सांगतां सहजा ॥ध्रु.॥ घातली लोळणी गा पुंडलीकें वाळवंटीं । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटीं । न देखे दुसरें गा । जाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥2॥ आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटें। न देखे न चलवे जना चालते वाटे । घातली लोळणी गा हरिनाम बोभाटे । पावला त्याकारणें धांव घातली नेटें ॥3॥ बैसोनि खोळी शुक राहे गर्भ आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा । मागील सोसिलें तें ना भीं ह्मणे गोपाळा । पावला त्याकारणें । लाज राखिली कळा ॥4॥ न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो सांडवी धना । आपपर तें ही नाहीं बंधुवर्ग सज्जना। तुकया ते चि परी जाली पावें नारायणा ॥5॥ 428 भगवंता तुजकारणें मेलों जीता चि कैसी । निष्काम बुद्धी ठेली चळण नाहीं तयासी । न चलती हात पाय दृिष्ट फिरली कैसी। जाणतां न देखों गा क्षर आणि अक्षरासी ॥1॥ विठोबा दान दे गा तुझ्या सारिखें नामा । कीतिऩ हे वाखाणिली थोर वाढली सीमा ॥ध्रु.॥ भुिH मुिH तूं चि एक होसि सिद्धीचा दाता । ह्मणोनि सांडवली शोक भय लज्जा चिंता । सर्वस्वें त्याग केला धांव घातली आतां। कृपादान देइप देवा येउनि सामोरा आतां ॥2॥ संसारसागरू गा भवदुःखाचें मूळ । जनवाद अंथरुण माजी केले इंगळ । इंिद्रयें वज्रघातें तपे उष्ण वरी जाळ । सोसिलें काय करूं दुर्भर हे चांडाळ ॥3॥ तिहीं लोकीं तुझें नाम वृक्ष पल्लव शाखा । वेंघलों वरि खोडा भाव धरूनि टेंका । जाणवी नरनारी जागो धरम लोकां । पावती पुण्यवंत सोइऩ आमुचिये हाका ॥4॥ नाठवे आपपर आतां काय बा करूं । सारिखा सोइसवा हारपला विचारू । घातला योगक्षेम तुज आपुला भारू । तुकया शरणागता देइप अभयकरू ॥5॥ वासुदेव - अभंग 6 429 मनु राजा एक देहपुरी । असे नांदतु त्यासि दोघी नारी। पुत्र पौत्र संपन्न भारी । तेणें कृपा केली आह्मांवरी गा ॥1॥ ह्मणउनि आलों या देशा । होतों नाहीं तरी भुललों दिशा । दाता तो मज भेटला इच्छा । येउनि मारग दाविला सरिसा गा॥ध्रु.॥ सवें घेउनि चौघेजण । आला कुमर सुलक्षण । कडे चुकवुनि कांटवण। ऐका आणिली तीं कोण कोण गा ॥2॥ पुढें भHीनें धरिलें हातीं। मागें Yाान वैराग्य धर्म येती । िस्थर केलीं जीं आचपळें होतीं । सिद्ध आणुनि लाविलीं पंथीं गा ॥3॥ केले उपकार सांगों काय । बाप न करी ऐसी माय । धर्में त्याच्या देखियेले पाय । दिलें अखय भय वारुनि दान गा ॥4॥ होतों पीडत हिंडतां गांव । पोट भरेना राहावया ठाव । तो येणें अवघा संदेह । ह्मणे फेडियेला तुकयाचा बंधव गा ॥5॥ 430 गातों वासुदेव मीं ऐका । चित्त ठेवुनि ठायीं भावें एका। डोळे झाकुनि रात्र करूं नका । काळ करीत बैसला लेखा गा ॥1॥ राम राम स्मरा आधीं । लाहो करा गांठ घाला मूळबंदीं । सांडावा उगिया उपाधी । लक्ष लावुनि राहा गोविंदीं गा ॥ध्रु.॥ ऐसा अल्प मानवी देह । शत गणिलें अर्ध रात्र खाय । पुढें बालत्व पीडा रोग क्षय । काय भजनासि उरलें तें पाहें गा ॥2॥ क्षणभंगुर नाहीं भरवसा। व्हा रे सावध सोडा माया आशा । न चळे बळ पडेल मग फासा । पुढें हुशार थोर आहे वोळसा गा ॥3॥ कांहीं थोडें बहुत लागपाठ । करा भिH भाव धरा बळकट । तन मन ध्यान लावुनियां नीट । जर असेल करणें गोड शेवट गा ॥4॥ विनवितों सकळां जनां । कर जोडुनि थोरां लाहनां । दान इतुलें द्या मज दीना । ह्मणे तुकयाबंधु राम ह्मणा गा ॥5॥ 431 गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा अझून । जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि झाकों लोचन गा ॥1॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसें जना । चिपऑया टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा गा ॥ध्रु.॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । द्या परी मीस घेऊं नका भाइऩ । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥2॥ देवाकारणें भाव तस्मात । द्यावें न लगे फारसें वित्त। जालें एक चित्त तरी बहुत । तेवढएासाठीं नका करूं वाताहात गा ॥3॥ आलों येथवरी बहु सायासें । करितां दान हें चि मागावयास। नका भार घेऊं करूं निरास । धर्म सारफळ संसारास गा ॥4॥ आतां मागुता येइऩल फेरा । हें तों घडे या नगरा । ह्मणे तुकयाबंधु धरा । ओळखी नाहीं तरी जाल अघोरा गा ॥5॥ 432 राम राम दोनी अक्षरें । सुलभ आणि सोपारें । जागा मागिले पाहारें । सेवटिचें गोड तें चि खरें गा ॥1॥ राम कृष्ण वासुदेवा । जाणवी जनासि । वाजवी चिपिळया । टाळ घाग†याघोषें गा ॥ध्रु.॥ गाय वासुदेव वासुदेवा । भिन्न नाहीं आणिका नांवा । दान जाणोनियां करीं आवा । न ठेवीं उरीं कांहीं ठेवा गा ॥2॥ एक वेळा जाणविती । धरूनियां राहा चित्तीं । नेघें भार सांडीं कामा हातीं। नीज घेउनि फिरती गा ॥3॥ सुपात्रीं सर्व भाव । मी तों सर्व वासुदेव । जाणती कृपाळु संत महानुभाव । जया भिन्न भेद नाहीं ठाव गा ॥4॥ शूर दान जीवें उदार । नाहीं वासुदेवी विसर । कीतिऩ वाढे चराचर । तुका ह्मणे तया नमस्कार गा ॥5॥ 433 बोल बोले अबोलणे । जागें बाहेर आंत निजेलें । कैसें घरांत घरकुल केलें । नेणों आंधार ना उजेडलें गा ॥1॥ वासुदेव करितों फेरा । वाडियांत बाहेर दारा । कोणी कांहीं तरी दान करा । जाब नेदा तरी जातों सामोरा गा ॥ध्रु.॥ हातीं टाळ दिंडी मुखीं गाणें। गजर होतो बहु मोटएानें । नाहीं निवडिलीं थोरलाहानें । नका निजों भिकेच्या भेणें गा ॥2॥ मी वासुदेव तत्वता । कळों येइऩल विचारितां। आहे ठाउका सभाग्या संतां । नाहीं दुजा आणीक मागता गा ॥3॥ काय जागाचि निजलासी । सुनें जागोन दारापासीं तुझ्या हितापाठीं करी व्यास व्यासी । भेटी न घेसी वासुदेवासी गा ॥4॥ ऐसें जागविलें अवघें जन । होतें संचित तींहीं केलें दान । तुका ह्मणे दुबळीं कोणकोण । गेलीं वासुदेवा विसरून गा ॥5॥ 434 रामकृष्ण गीती गात । टाळ चिपळएा वाजवीत । छंदें आपुलिया नाचत । नीज घेऊनि फिरत गा ॥1॥ जनीं वनीं हा अवघा देव । वासनेचा हा पुसावा ठाव । मग वोळगती वासुदेव । ऐसा मनीं वसूं द्यावा भाव गा ॥ध्रु.॥ निज दासाची थोर आवडी । वासुदेवासि लागली गोडी । मुखीं नाम उच्चारी घडोघडीं । ऐसी करा हे वासुदेवजोडी गा ॥2॥ अवघा सारूनि सेवट जाला । प्रयत्न न चले कांहीं केला । जागा होइप सांडुनि झोपेला । दान देइप वासुदेवालागा ॥3॥ तुका ह्मणे रे धन्य त्याचें जिणें । जींहीं घातलें वासुदेवा दान। त्याला न लगे येणें जाणें । जालें वासुदेवीं राहणे गा ॥4॥ ।6॥ गांवगुंड - अभंग 1 435 आह्मी जालों गांवगुंड । अवघ्या पुंड भूतांसी ॥1॥ दुसरें तें खेळों आलें । एका बोले तो मियां ॥ध्रु.॥ अवघियांचा येऊं लाग । नेदूं अंग शिवाया ॥2॥ तुका ह्मणे खुंटूं नाद । जिंतूं वाद सर्तीनें ॥3॥ ॥1॥ जोगी - अभंग 1 436 जग जोगी जग जोगी । जागजागे बोलती ॥1॥ जागता जगदेव । राखा कांहीं भाव ॥ध्रु.॥ अवघा क्षेत्रपाळ । पूजा सकळ ॥2॥ पूजापात्र कांहीं । फल पुष्प तोय ॥3॥ बहुतां दिसां फेरा । आला या नगरा ॥4॥ नका घेऊं भार । धर्म तो चि सार ॥5॥ तुका मागे दान । द्या जी अनन्य ॥6॥ ॥1॥ सरवदा - अभंग 1 437 एका गा ए भाइऩ । सरवदा सांगतो काइऩ । येथें नाडेल माइऩ । दोघां पुत्रांची । ते करिती तिची विटंबना । अवघ्या प्रसिद्ध जना । एक न मारितां शाहाणा । तो जाणा सुख न पवे ॥1॥ आणीक ऐका गा ए । सरवदा सांगतो काय । खरें चि बोले तो जाय। नरकामध्यें अधोगती । हें चौघांच्या मुखें । मना आणावें सुखें। अवघीं चुकती दुःखें । खोटें बोला नरनारी ॥ध्रु.॥ आणीक नाडेल एक जाण । सरवदा बोलतो वचन । जागें माझें ह्मणोन । पडिलें खान तया घरीं । ह्मणोन न ह्मणा माझें कांहीं । निजीं निजा सुखें ठायीं । यत्न होइऩल तइप । चोराठायीं विश्वास ॥2॥ आणीक एकी परी । सरवदा सांगतो थोरी । दुःख पावेल नारी । पतिव्रता यामधीं । पांचांनीं दिधली हातीं । ह्मणोनि न मनावी नििश्चती । परपुरुषीं होय रती । सुखगती ते पावे ॥3॥ एकी परी । सरवदा सांगतो तें करीं । दान देतां जो न वारी । नव्हे भला भला तो तुका ह्मणे आइऩ । येथें नांव काइऩ । सांगसी तें ठायीं । मरो रांडेचें ॥4॥ ॥1॥ मुंढा - अभंग 3 438 संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥1॥ प्यार खुदाइऩ रे बाबा जिकिर खुदाइऩ ॥ध्रु.॥ उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेकां खचलावत भार ॥2॥ कहे तुका चलो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥3॥ 439 सब संबाल भ्याने लौंढे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥1॥ आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूँगा हाल ॥ध्रु.॥ आवलका तो पीछें नहीं मुदल बिसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गधे गोते खाय ॥2॥ जिन्हो खातिर इतना होता सो नहीं तुझे बेफाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥3॥ निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जबानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥4॥ कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पकड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥5॥ 440 आवल नाम आल्ला बडा लेते भुल न जाये । इलाम त्याकालजमुपरताहाी तुंब बजाये ॥1॥ आल्ला एक तुं नबी एक तुं ॥ध्रु.॥ काटतें सिर पावों हात नहीं जीव उराये । आगले देखे पिछले बुझे । आपें हजुर आयें ॥2॥ सब सबरी नचाव म्याने । खडा आपनी सात । हात पावों रखते जबाब । नहीं आगली बात ॥3॥ सुनो भाइऩ बजार नहीं । सब हि निरचे लाव । नन्हा बडा नहीं कोये एक ठोर मिलाव ॥4॥ एक तार नहीं प्यार । जीवतनकी आस । कहे तुका सो हि मुंढा । राखलिये पायेनपास ॥5॥ ॥3॥ डोइऩ फोडा - अभंग 1 441 तम भज्याय ते बुरा जिकीर ते करे । सीर काटे ऊर कुटे ताहां सब डरे ॥1॥ ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हमें तुह्में नहीं ॥ध्रु.॥ दिदार देखो भुले नहीं किशे पछाने कोये । सचा नहीं पकडुं सके झुटा झुटे रोये ॥2॥ किसे कहे मेरा किन्हे सात लिया भास । नहीं मेलो मिले जीवना झुटा किया नास ॥3॥ सुनो भाइऩ कैसा तो ही । होय तैसा होय । बाट खाना आल्ला कहना एकबारां तो ही ॥4॥ भला लिया भेक मुंढे । आपना नफा देख । कहे तुका सो ही संका । हाक आल्ला एक ॥5॥ ॥1॥ मलंग - अभंग 1 442 नजर करे सो ही जिंके बाबा दुरथी तमासा देख । लकडी फांसा लेकर बैठा आगले ठकण भेख ॥1॥ काहे भुला एक देखत आंखो मार तडांगो बाजार ॥ध्रु.॥ दमरी चमरी जो नर भुला। सोत आघो हि लत खाये ॥2॥ नहि बुलावत किसे बाबा आप हि मत जाये । कहे तुका उस असाके संग फिरफिर गोदे खाये ॥3॥ ॥1॥ दरवेस -अभंग 1 443 अल्ला करे सो होय बाबा करतारका सिरताज । गाउ बछरे तिस चलावे यारी बाघो न सात ॥1॥ ख्याल मेरा साहेबका। बाबा हुवा करतार । व्हांटें आघे चढे पीठ । आपे हुवा असुवार ॥2॥ जिकिर करो अल्लाकी बाबा सबल्यां अंदर भेस । कहे तुका जो नर बुझे सो हि भया दरवेस ॥3॥ ॥1॥ वैद्यगोळी - अभंग 1 444 अल्ला देवे अल्ला दिलावे अल्ला दारु अल्ला खलावे। अल्ला बगर नही कोये अल्ला करे सो हि होये ॥1॥ मदऩ होये वो खडा फीर नामदऩकुं नहीं धीर । आपने दिलकुं करना खुसी तीन दामकी क्या खुमासी ॥ध्रु.॥ सब रसोंका किया मार । भजनगोली एक हि सार । इमान तो सब ही सखा । थोडी तो भी लेकर ज्या ॥2॥ जिन्हो पास नीत सोये । वो हि बसकर तिरोवे । सांतो पांचो मार चलावे । उतार सो पीछे खावे ॥3॥ सब ज्वानी निकल जावे। पीछे गधडा मटी खावे । गांवढाळ सो क्या लेवे । हगवनि भरी नहि धोवे ॥4॥ मेरी दारु जिन्हें खाया । दिदार दरगां सो हि पाया । तल्हे मुंढी घाल जावे । बिगारी सोवे क्या लेवे ॥5॥ बजारका बुझे भाव। वो हि पुसता आवे ठाव । फुकट बाटु कहे तुका । लेवे सोहि लें हिसखा ॥6॥ ॥1॥ गोंधळ - अभंग 3 445 राजस सुंदर बाळा । पाहों आलिया सकळा वो । बिबीं बिंबोनि ठेली माझी परब्रह्म वेल्हाळा वो । कोटि रविशशि माझी। परब्रह्म वेल्हाळा वो ॥1॥ राजस विठाबाइऩ । माझें ध्यान तुझे पायीं वो । त्यजुनियां चौघींसी । लावी आपुलिये सोइऩ वो ॥ध्रु.॥ सकुमार साजिरी । कैसीं पाउलें गोजिरीं वो । कंठीं तुळसीमाळा उभी भीवरेच्या तिरीं वो । दंत हिरया ज्योति । शंखचक्र मिरवे करीं वो ॥2॥ निर्गुण निराकार । वेदां न कळे चि आकार वो । शेषादिक श्रमले श्रुती न कळे तुझा पार वो । उभारोनि बाहे । भHां देत अभयकर वो ॥3॥ येउनि पंढरपुरा । अवतरली सारंगधरा वो । देखोनि भिH भाव वोरसली अमृतधारा वो । देउनि प्रेमपान्हा । तुकया स्वामीनें किंकरा वो ॥4॥ 446 सुदिन सुवेळ । तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे । दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥1॥ पंढरपुरनिवासे । तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा । मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥ मांडिला देव्हारा । तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला । नाभिकळस ठेविला वरी वो ॥2॥ बैसली देवता । पुढें वैष्णवाचें गाणें वो । उद्गारे गर्जती । कंठीं तुळसीचीं दर्शनें वो ॥3॥ स्वानंदाचे ताटीं । धूप दीप पंचारती वो । ओवािळली माता । विठाबाइऩ पंचभूतीं वो ॥4॥ तुझें तुज पावलें । माझा नवस पुरवीं आतां वो । तुका ह्मणे राखें । आपुलिया शरणागता वो ॥5॥ 447 सुंदर मुख साजिरें । कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा । [[केशर]] कस्तुरी मळवटीं वो । विशाळ व्यंकट नेत्र । वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची । चंदन सुगंध साजे उटी वो ॥1॥ अतिबरवंटा बाळा । आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी। मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो । कोटि रविशशिप्रभा लोपल्या सकळा वो । न कळे ब्रह्मादिकां । अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु.॥ सावळी सकुमार । गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ । सुढाळ पदक झळके वरी वो । कटीं क्षुद्र घंटिका । शब्द करिताती माधुरी वो । गर्जत चरणीं वाकी । अभिनव संगीत नृत्य करी वो ॥2॥ अष्टांगें मंडित काय । वर्णावी रूपठेवणी वो । शोधिव सुंदर रसाची ओतिली। सुगंध लावण्यखाणी वो । सर्वकळासंपन्न । मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली । आदिशिH नारायणी वो ॥3॥ घटस्थापना केली । पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला । तिन्ही ताळांवरी वो । आरंभिला गोंधळ इनें । चंद्रभागेतिरीं वो । आली भिHकाजा। कृष्णाबाइऩ योगेश्वरी वो ॥4॥ तेहतिस कोटि देव । चौंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंडएा । करिती पुष्पांचा वरुषाव वो । नारद तुंबर गायन । ब्रह्मानंद करिती गंधर्व वो। वंदी चरणरज तेथें । तुकयाचा बंधव वो ॥5॥ 448 शंख करिशी ज्याच्या नांवें । त्याचें तुज नाहीं ठावें । ऐक सांगतों एका भावें । सांपडे घरीं तें जीवउनि खावें । रे विठ्ठल ॥1॥ टिळे माळा करंडी सोंग । धरुनि चाळविलें जग । पसरी हात नाहीं त्याग । दावी दगड पुजी भग । रे विठ्ठल ॥2॥ राख लावुनि अंग मळी । वाये ठोके मी एक बळी । वासने हातीं बांधवी नळी। त्यासि येउनि गिळी । रे विठ्ठल ॥3॥ कोण तें राहडीचें सुख । वरते पाय हारतें मुख । करवी पीडा भोगवी दुःख । पडे नरकीं परी न पळे चि मूर्ख । रे विठ्ठल ॥4॥ सिकला फाक मारी हाका । रांडा पोरें मेळवी लोकां । विटंबी शरीर मागे रुका । केलें तें गेलें अवघें चि फुका । रे विठ्ठल ॥5॥ कळावें जनां मी एक बळी । उभा राहोनि मांडी फळी । फोडोनि गुडघे कोंपर चोळी । आपला घात करोनि आपण चि तळमळे । रे विठ्ठल ॥6॥ फुकट खेळें ठकलीं वांयां । धरुनि सोंग बोडक्या डोया । शिवों नये ती अंतरीं माया । संपादणीविण विटंबिली काया । रे विठ्ठल ॥7॥ धुळी माती कांहीं खेळों च नका। जवादी चंदन घ्यावा बुका । आपणा परिमळ आणिकां लोकां । मोलाची महिमा फजिती फुका । रे विठ्ठल ॥8॥ बहुत दुःखी जालियां खेळें । अंगीं बुिद्ध नाहींत बळें । पाठीवरी तोबा तोंड काळें । रसना द्रवे उपस्थाच्या मुळें । रे विठ्ठल ॥9॥ काय सांगतो तें ऐका तुका। मोडा खेळ कांहीं अवगों च नका । चला जेवूं आधीं पोटीं लागल्या भुका । धाल्यावरी बरा टाकमटिका। रे विठ्ठल ॥10॥ 449 ऐक बाइऩ तुज वो कांहीं सांगतें शकुन । निजलिया भुर होसी जागें ह्मणउन ॥1॥ मान्य माझें केलें सांगतें एका बोलें । न येतां हे भलें कळों कोणा लोकांसि ॥ध्रु.॥ सांगतें गुण जीवीची खुण ऐक माझी मात । बैस एका भावें माझे हातीं दे वो हात ॥2॥ बरवा घरचार तुज सांपडला ठाव । फळ नाहीं पोटीं येथें दिसे खोटा भाव ॥3॥ आहे तुझे हातीं एका नवसाचें फळ । भावा करीं साहए चहूं अठरांच्या बळें ॥4॥ करीं लागपाठ चित्त वित्त नको पाहों । अखइऩ तो चुडा तुज भोगइऩल ना हो ॥5॥ कुळींची हे मुळी तुझे लागलीसे देवी । पडिला विसर नेदी फळ नाहीं ठावी ॥6॥ तुका ह्मणे नांद सुखें धरीं आठवण । माझ्या येती कोणी त्यांचा राख बरा मान ॥7॥ कावडे - अभंग 5 450 आहा रे भाइऩ । प्रथम नमूं तो विनायक । ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥1॥ माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी । पान्हेरीनें मार्ग मळी। जीवन घ्या रे कापडि हो ॥2॥ जें या सीतळाहुनि सीतळ। पातळाहुनि जें पातळ । प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥3॥ जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान । धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥4॥ काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव । शुद्ध सत्वीं राखोनि भाव । ह्मणा महादेव हरिहर वाणी गजाॉ द्या ॥5॥ पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन । जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर ह्मणों तया ॥6॥ शिH वेचाविया परउपकारा । खोटें खोटएाचा पसारा । सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥7॥ व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर । पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥8॥ संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा । पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥9॥ तुका चालवितो कावडी । प्रवृित्त निवृित्त चोखडी । पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥10॥ 451 आहा आहा रे भाइऩ । हें अन्नदानाचें सत्र । पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥1॥ यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें । पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि ह्मणा रे ॥2॥ नव्हे हें कांहीं मोकळें। साक्षी चौघांचिया वेगळें । नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा सािक्षत्वें हरि ह्मणा रे ॥3॥ हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली । विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । ह्मणा हर हर महादेव ॥4॥ तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ । या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥5॥ 452 आहा रे भाइऩ । नमो उदासीन जाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥1॥ नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥2॥ नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥3॥ नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥4॥ नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥5॥ परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंिद्रयांसि ॥6॥ तुका ह्मणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥7॥ 453 आहा रे भाइऩ । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥1॥ थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥ बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिका†यास नये दारा ॥2॥ विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥3॥ गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राह्मण अतीत घडे चि ना ॥4॥ सदा सर्वकाळ करितो चि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥5॥ खासेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥6॥ तुका ह्मणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भिHभावें ॥7॥ 454 आहा रे भाइऩ । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ। तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥1॥ समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण ह्मणों नये लिंगा । संत नव्हती जगा। मानसा त्या सारिखे ॥2॥ काठी ह्मणों नये वेतु । अन्न ह्मणों नये सांतु । राम राम हे मातु । नये ह्मणों शब्द हे ॥3॥ चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥4॥ गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न ह्मणावी ॥5॥ कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रह्मा नव्हे जीव । स्त्री नव्हे लIमी ॥6॥ गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते इऩश्वरीचे ॥7॥ सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥8॥ मुHाफळें नव्हेति गारा । खडएाऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥9॥ गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूतिऩ । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥10॥ कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥11॥ ॥5॥ सौ†या - अभंग 11 455 वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥1॥ त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥ जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥2॥ वेगऑया याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें। टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥3॥ सकळांमधीं आगळी बुिद्ध तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भHी नाचों भावा ॥4॥ ह्मणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥5॥ 456 आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥1॥ तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा। पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥2॥ तुका ह्मणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥3॥ 457 टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव ह्मणोनि देतें सिवी ॥1॥ आतां येणें छंदें नाचों विनोदें। नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥ कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळऴिचया ठाया ॥2॥ याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका ह्मणे तुह्मा गांठी सोडायाची खंती ॥3॥ 458 मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥1॥ ऐका बाइऩ लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥ न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥2॥ देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका ह्मणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥3॥ 459 सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥1॥ या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥ अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाइप । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥2॥ तुका ह्मणे वोळगों एका तोड चिंता माया। देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥3॥ 460 सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥1॥ चाल विठाबाइऩ अवघी पांज देइप । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥ हिंडोनि चौ†यांशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥2॥ लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥3॥ जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥4॥ तुका ह्मणे रुका करी संसारतुटी । आतां तुह्मां आह्मां कैसी जाली जीवे साटीं ॥5॥ 461 सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥1॥ गाऊं रघुरामा हें चि उरलें आह्मां। नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥ ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥2॥ सौरीयांचा संग आह्मां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥3॥ लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥4॥ तुका ह्मणे हा आह्मां वेष दिला जेणें। जनाप्रचित सवें असों एकपणें ॥5॥ 462 नव्हे नरनारी संवसारीं अंतरलों निर्लज्ज निष्काम जना वेगळे चि ठेलों ॥1॥ चाल रघुरामा न आपुल्या गांवा । तुजविण आह्मां कोण सोयरा सांगाती ॥ध्रु.॥ जनवाद लोकनिंद्य पिशुनाचे चेरे। साहूं तुजसाठीं अंतरलीं सहोदरें ॥2॥ बहुता पाठीं निरोप हाटीं पाठविला तुज । तुका ह्मणे आतां सांडुनि लौकिक लाज ॥3॥ 463 नीट पाट करूनि थाट । दावीतसे तोरा । आपणाकडे पाहो कोणी । निघाली बाजारा ॥1॥ ते सौरी नव्हे निकी । भHीविण फिकी ॥ध्रु.॥ चांग भांग करूनि सोंग । दावी माळा मुदी । रुक्याची आस धरूनि । हालवी ती फुदी ॥2॥ थोरे घरीं करी फेरी । तेथें नाचे बरी । जेथें निघे रुका । तेथें हालवी टिरी ॥3॥ आंत मांग बाहेर चांग । सौरी ती नव्हे तेग । तुका दास नटतसे । न करी त्याचा संग ॥4॥ 464 चाल माझ्या राघो । डोंगरीं दिवा लागो ॥ध्रु.॥ घर केलें दार केलें । घरीं नाहीं वरो । सेजारणी पापिणीचीं पांच पोरें मरो ॥1॥ घरीं पांच पोरें । तीं मजहुनि आहेत थोरें । पांचांच्या बळें । खादलीं बावन केळें ॥2॥ घर केलें दार केलें । दुकान केला मोटा। पाटाची राणी धांगडधिंगा तिचा मोटा ॥3॥ दुकान केला मोटा । तर पदरीं रुका खोटा । हिजडा ह्मणसी जोगी । तर सोळा सहस्र भोगी । तुका ह्मणे वेगीं । तर हरि ह्मणा जगीं ॥4॥ 465 जन्मा आलिया गेलिया परी । भिH नाहीं केली । माझें माझें ह्मणोनियां । गुंतगुंतों मेलीं ॥1॥ येथें कांहीं नाहीं । लव गुरूच्या पायीं । चाल रांडें टाकी रुका । नकों करूं बोल । गुरुविण मार्ग नाहीं । करिसी तें फोल ॥2॥ खाउनी जेउनि लेउनि नेसुनि । ह्मणती आह्मी ब†या । साधु संत घरा आल्या । होती पाठमो†या ॥3॥ वाचोनि पढोनि जाले शाहणे । ह्मणती आह्मी संत । परनारी देखोनि त्यांचें । चंचळ जालें चित्त ॥4॥ टिळा टोपी घालुनि माळा। ह्मणती आह्मी साधु । दयाधर्म चित्तीं नाहीं । ते जाणावे भोंदु ॥5॥ कलियुगीं घरोघरीं । संत जाले फार । वीतिभरी पोटासाठीं । हिंडती दारोदार ॥6॥ संत ह्मणती केली निंदा । निंदा नव्हे भाइऩ । तुका असे अनन्यें भावें शरण संतां पायीं ॥7॥ ॥11॥ वाघा - अभंग 1 466 अनंत जुगाचा देव्हारा । निजबोधांचा घुमारा । अवचिता भरला वारा । या मल्लारी देवाचा ॥1॥ शुद्धसkवाचा कवडा मोठा। बोधबिरडें बांधला गांठा । गळां वैराग्याचा पट्टा । वाटा दावूं या भHीच्या ॥2॥ हृदय कोटंबा सांगातें । घोळ वाजवूं अनुहातें। Yाानभांडाराचें पोतें । रितें नव्हे कल्पांतीं ॥3॥ लक्ष चौ†यांशी घरें चारी । या जन्माची केली वारी । प्रसन्न जाला देव मल्लारी । सोहंभावीं राहिलों ॥4॥ या देवाचें भरतां वारें । अंगीं प्रेमाचें फेंपरें। गुरुगुरु करी वेडे चारें । पाहा तुकें भुंकविलें ॥5॥ ॥1॥ लिळत - अभंग 11 467 आजी दिवस जाला । धन्य सोनियाचा भला ॥1॥ जालें संताचे पंगती । बरवें भोजन निगुती ॥ध्रु.॥ रामकृष्णनामें । बरवीं मोहियेलीं प्रेमें ॥2॥ तुका ह्मणे आला । चवी रसाळ हा काला ॥3॥ 468 तुह्मी तरी सांगा कांहीं । आह्मांविशीं रखुमाबाइऩ ॥1॥ कांहीं उरलें तें ठायीं । वेगीं पाठवुनी देइप ॥ध्रु.॥ टोकत बैसलों देखा। इच्छीतसें ग्रासा एका ॥2॥ प्रेम देउनि बहुडा जाला । तुका ह्मणे विठ्ठल बोला ॥3॥ 469 वाट पाहें बाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृिष्ट लागलें चित्त ॥1॥ कइप येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥ डावा डोळा लवे उजवी स्फुरते बाहे । मन उताविळ भाव सांडुनियां देहे ॥2॥ सुखसेजे गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तान पळाली भूक ॥3॥ तुका ह्मणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥4॥ 470 तुझें दास्य करूं आणिका मागों खावया । धिग् जालें जिणें माझें पंढरीराया ॥1॥ काय गा विठोबा तुज ह्मणावें । थोराच्या दैवें गोड शुभअशुभ ॥ध्रु.॥ संसाराचा धाक निरंतर आह्मांसी। मरण भलें परि काय अवकळा तैसी ॥2॥ तुझे शरणागत शरण जाऊं आणिकांसी । तुका ह्मणे कवणा लाज हें कां नेणसी ॥3॥ 471 पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥1॥ माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥ घेतलें नुतरी उचलोनि कडियेवरी ॥2॥ तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥3॥ 472 कथेची सामुग्री । देह अवसानावरी ॥1॥ नको जाऊं देऊं भंगा । गात्रें माझीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ आयुष्य करीं उणें । परी मज आवडो कीर्तन ॥2॥ तुका ह्मणे हाणी । या वेगळी मना नाणीं ॥3॥ 473 गिळत जाली काया । हें चि लिळत पंढरिराया ॥1॥ आलें अवसानापासीं । रूप राहिलें मानसीं ॥ध्रु.॥ वाइला कळस । तेथें िस्थरावला रस ॥2॥ तुका ह्मणे गोड जालें । नारायणीं पोट धालें ॥3॥ 474 रत्नजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥1॥ कुंचे ढळती दोहीं बाहीं । जवळी रखुमाइऩ राही ॥ध्रु.॥ नाना उपचारीं । सििद्ध वोळगती कामारी ॥2॥ हातीं घेऊनि पादुका । उभा बंदिजन तुका ॥3॥ 475 हिरा शोभला कोंदणीं । जडित माणिकांची खाणी ॥1॥ तैसा दिसे नारायण । मुख सुखाचे मंडण ॥ध्रु.॥ कोटि चंद्रलीळा । पूणिऩमेच्या पूर्णकळा ॥2॥ तुका ह्मणे दृिष्ट धाये । परतोनि माघारी ते न ये ॥3॥ 476 पतित पतित । परी मी त्रिवाचा पतित ॥1॥ परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता ॥ध्रु.॥ नाहीं चित्तशुिद्ध । िस्थर पायांपाशीं बुिद्ध ॥2॥ अपराधाचा केलों । तुका ह्मणे किती बोलों ॥3॥ 477 उभारिला हात । जगीं जाणविली मात ॥1॥ देव बैसले सिंहासनीं । आल्या याचका होय धनी ॥ध्रु.॥ एकाच्या कैवाडें । उगवे बहुतांचें कोडें ॥2॥ दोहीं ठायीं तुका । नाहीं पडों देत चुका ॥3॥ ॥11॥ आशीर्वाद - अभंग 5 478 जीवेंसाटीं यत्नभाव । त्याची नाव बळकट ॥1॥ पैल तीरा जातां कांहीं । संदेह नाहीं भवनदी ॥ध्रु.॥ विश्वासाची धन्य जाती। तेथें वस्ती देवाची ॥2॥ तुका ह्मणे भोिळयांचा । देव साचा अंकित ॥3॥ 479 आशीर्वाद तया जाती । आवडी चित्तीं देवाची ॥1॥ कल्याण ती असो क्षेम । वाढे प्रेम आगळें ॥ध्रु.॥ भिHभाग्यगांठी धन। त्या नमन जीवासी ॥2॥ तुका ह्मणे हरिचे दास । तेथें आस सकळ ॥3॥ 480 तया साटीं वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥1॥ क्षेम माझे हरिजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥ परत्रींचे जे सांगाती। त्यांची याती न विचारीं ॥2॥ तुका ह्मणे धैर्यवंतें । निर्मळचित्तें सरवीं तीं ॥3॥ 481 अभय उत्तर संतीं केलें दान । जालें समाधान चित्त तेणें ॥1॥ आतां प्रेमरसें न घडे खंडण । द्यावें कृपादान नारायणा ॥ध्रु.॥ आलें जें उचित देहविभागासी । तेणें पायांपासीं उभी असों ॥2॥ तुका ह्मणे करी पूजन वैखरी । बोबडा उत्तरीं गातों गीत ॥3॥ 482 असो मंत्रहीन क्रिया । नका चर्या विचारूं ॥1॥ सेवेमधीं जमा धरा । कृपा करा शेवटीं ॥ध्रु.॥ विचारूनि ठाया ठाव। येथें भाव राहिला ॥2॥ आतां तुकयापाशीं हेवा । नाहीं देवा तांतडी ॥3॥ ॥5॥ 483 ऐकें वचन कमळापती । मज रंकाची विनंती ॥1॥ कर जोडितों कथाकाळीं । आपण असावें जवळी ॥ध्रु.॥ घेइप ऐसी भाक। मागेन जरि कांहीं आणिक ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे देवा । शब्द इतुका राखावा ॥3॥ 484 आली लिळताची वेळ । असा सावध सकळ ॥1॥ लाहो करा वेगीं स्मरा । टाळी वाउनि विश्वंभरा ॥ध्रु.॥ जालिया अवसान । न संपडती चरण ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे थोडें । अवधि उरली आहे पुढें ॥3॥ 485 नेणें गाऊं कांहीं धड बोलतां वचन । कायावाचामनेंसहित आलों शरण ॥1॥ करीं अंगीकार नको मोकलूं हरी । पतितपावन िब्रदें करावीं खरीं ॥ध्रु.॥ नेणें भिHभाव तुझा ह्मणवितों दास । जरि देसी अंतर तरि लज्जा कोणास ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु तुझे धरियेले पाये । आतां कोण दुजा ऐसा आह्मांसी आहे ॥3॥ 486 तूं च मायबाप बंधु सखा आमचा । वित्त गोत जीवलग जीवाचा ॥1॥ आणीक प्रमाण नाहीं दुसरें आतां । योगक्षेमभार तुझे घातला माथां ॥ध्रु.॥ तूं च क्रियाकर्म धर्म देव तूं कुळ । तूं च तप तीर्थ व्रत गुरु सकळ ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु करिता कार्यता देवा । तूं च भाव भिH पूजा पुनस्कार आघवा ॥3॥ 487 करुनि उचित । प्रेम घालीं हृदयांत ॥1॥ आलों दान मागायास । थोरी करूनियां आस ॥ध्रु.॥ चिंतन समयीं । सेवा आपुली च देइप ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे भावा । मज निरवावें देवा ॥3॥ 488 गाऊं वाऊं टाळी रंगीं नाचों उदास । सांडोनि भय लज्जा शंका आस निरास ॥1॥ बिळयाचा बळी तो कैवारी आमुचा। भुिHमुिHदाता सकळां ही सिद्धींचा ॥ध्रु.॥ मारूं शब्दशस्त्रबाण निःशंक अनिवार । कंटकाचा चुर शिर फोडूं काळाचें ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु नाहीं जीवाची चाड । आपुलिया तेथें काय आणिकांची भीड ॥3॥ 489 सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥1॥ आला आला रे जगजेठी । भHा पुंडलिकाचे भेटी ॥ध्रु.॥ पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करीं ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥3॥ 490 कृपाळु भHांचा । ऐसा पति गोपिकांचा ॥1॥ उभा न पाचारितां दारीं । न संगतां काम करी ॥ध्रु.॥ भाव देखोनि निर्मळ। रजां वोडवी कपाळ ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे न भजा । कां रे ऐसा भोळा राजा ॥3॥ 491 केला अंगीकार पंढरीच्या देवें । आतां काय करिती काळ मशक मानवें ॥1॥ घातलीं बाहेर तीं भय होतें ज्यानें । बैसला आपण तेथें घालुनियां ठाणें ॥ध्रु.॥ लागों नेदी वारा दुजियाचा अंगासी । हा पुरता निर्धार कळों आला आह्मांसी ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु न लगे करावी चिंता । कोणेविशीं आतां बैसलों हस्तीवरी माथां ॥3॥ 492 अगोचरी बोलिलों आYोविण आगळें । परी तें आतां न संडावें राउळें ॥1॥ जाइऩल रोकडा बोल न पुसती आह्मां । तुझा तुझें ह्मणविलें पाहा पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥ न व्हावा न वजावा न कळतां अन्याय । न धरावें तें मनीं भलता करा उपाय ॥2॥ ह्मणे तुकयाबंधु हीन मी ह्मणोनि लाजसी । वारा लागों पाहातोहे उंच्या झाडासी ॥3॥ 493 जाली पाकसििद्ध वाट पाहे रखुमाइऩ । उदक तापलें डेरां चीकसा मदुऩिन अइऩ ॥1॥ उठा पांडुरंगा उशीर जाला भोजनीं। उभ्या आंचवणा गोपी कळस घेउनी ॥ध्रु.॥ अवघ्या सावचित्त सेवेलागीं सकळा । उद्धव अक्रूर आले पाचारूं मुळा ॥2॥ सावरिली सेज सुमनयाति सुगंधा । रत्नदीप ताटीं वाळा विडिया विनोदा ॥3॥ तुका विनंती करी पाहे पंढरीराणा । असा सावचित्त सांगे सकळा जना ॥4॥ 494 उठा सकळ जन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥1॥ करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥ध्रु.॥ जोडोनि दोन्ही कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥2॥ तुका ह्मणे काय पढियंतें तें मागा । आपुलालें सांगा सुख दुःखें ॥3॥ 495 करूनी विनवणी पायीं ठेवीं माथा । परिसावी विनवणी माझी पंढरीनाथा ॥1॥ अखंडित असावेंसें वाटतें पायीं । साहोनि संकोच ठाव थोडासा देइप ॥ध्रु.॥ असो नमो भाव आलों तुझिया ठाया। पाहें कृपादृष्टी मज पंढरीराया ॥2॥ तुका ह्मणे आह्मीं तुझीं वेडीं वांकडीं । नामें भवपाश हातें आपुल्या तोडीं ॥3॥ 496 घडिया घालुनि तळीं चालती वनमाळी । उमटती कोमळीं कुंकुमाचीं ॥1॥ वंदा चरणरज अवघे सकळ जन । तारियेले पाषाण उदकीं जेणें ॥ध्रु.॥ पैस धरुनी चला ठाकत ठायीं ठायीं । मौन्य धरुनी कांहीं नो बोलावें ॥2॥ तुका अवसरु जाणवितो पुढें। उघडलीं महाल मंदिरें कवाडें ॥3॥ 497 भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होइऩल फळ धीर करावा ॥1॥ न करीं त्वरा ऐकें मात । क्षण एक निवांत बैसावें ॥ध्रु.॥ करूनी मदऩन सारिलें पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥2॥ नेसला सोनसळा विनवी रखुमाइऩ । वाढिलें आतां ठायीं चलावें जी ॥3॥ करुनियां भोजन घेतलें आंचवण । आनंदें नारायण पहुडले ॥4॥ तुका मात जाणवी आतां । सकळां बहुतां होती ची ॥5॥ 498 द्या जी आह्मां कांहीं सांगा जी रखुमाइऩ । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥1॥ टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥ येथवरी आलों तुझिया नांवें । आस करुनी आह्मी दातारा ॥2॥ प्रेम देउनियां बहुडा आतां दिला । तुका ह्मणे आतां विठ्ठल बोला ॥3॥ 499 बहुडविलें जन मन जालें निश्चळ । चुकवूनी कोल्हाळ आला तुका ॥1॥ पयपकीं निद्रा करावें शयन । रखुमाइऩ आपण समवेत ॥ध्रु.॥ घेउनियां आलों हातीं टाळ वीणा । सेवेसि चरणा स्वामीचिया ॥2॥ तुका ह्मणे आतां परिसावीं सादरें । बोबडीं उत्तरें पांडुरंगा ॥3॥ 500 नाच गाणें माझा जवळील ठाव । निरोपीन भाव होइऩल तो ॥1॥ तुह्मां निद्रा मज आYाा ते स्वभावें । उतरूनि जीवें जाइऩन लोण ॥ध्रु.॥ एकाएकीं बहु करीन सुस्वरें । मधुर उत्तरें आवडीनें ॥2॥ तुका ह्मणे तूं जगदानी उदार । फेडशील भार एका वेळा ॥3॥ 501 सिणलेती सेवकां देउनि इच्छादान । केला अभिमान अंगीकारा ॥1॥ अहो दीनानाथा आनंदमूर्ती । तुह्मांसि शोभती ब्रीदें ऐसीं ॥ध्रु.॥ बहुतांनीं विनविलें बहुतां प्रकारीं । सकळां ठायीं हरी पुरलेती ॥2॥ तुका ह्मणे अगा कुटुंबवत्सळा । कोण तुझी लीळा जाणे ऐसी ॥3॥ 502 उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥1॥ वाट पाहाते रुिक्मणी । उभी मंचक संवारुणी ॥ध्रु.॥ केली करा क्षमा। बडबड पुरुषोत्तमा ॥2॥ लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥3॥ 503 पावला प्रसाद आतां विटोनि जावें । आपला तो श्रम कळों येतसे जीवें ॥1॥ आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । पुरले मनोरथ जातों आपुलिया स्थळा ॥ध्रु.॥ तुह्मांसि जागवूं आह्मी आपुलिया चाडा । शुभाशुभ कर्में दोष वाराया पीडा ॥2॥ तुका ह्मणे दिलें उिच्छष्टाचें भोजन । आह्मां आपुलिया नाहीं निवडिलें भिन्न ॥3॥ 504 शब्दांचीं रत्नें करूनी अळंकार । तेणें विश्वंभर पूजियेला ॥1॥ भावाचे उपचार करूनि भोजन । तेणें नारायण जेवविला ॥ध्रु.॥ संसारा हातीं दिलें आंचवण । मुखशुद्धी मन समपिऩलें ॥2॥ रंगलीं इंिद्रयें सुरंग तांबूल । माथां तुळसीदळ समपिऩलें ॥3॥ एकभावदीप करूनि निरांजन । देऊनि आसन देहाचें या ॥4॥ न बोलोनि तुका करी चरणसेवा । निजविलें देवा माजघरीं ॥5॥ 505 उठोनियां तुका गेला निजस्थळा । उरले राउळा माजी देव ॥1॥ निउल जालें सेवका स्वामींचें । आYो करुनी चित्त समाधान ॥ध्रु.॥ पहुडलिया हरी अनंतशैनावरी । तेथें नाहीं उरी कांहीं काम ॥2॥ अवघी बाहेर घालूनि गेला तुका । सांगितलें लोकां निजले देव ॥3॥ दसरा - अभंग 1 506 पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा । सांपडला तो साधा आजि मुहूर्त बरा । गर्जा जेजेकार हरि हृदयीं धरा । आळस नका करूं लाहानां सांगतों थोरां ॥1॥ या हो या हो बाइयानो निघाले हरी। सिलंगणा वेगीं घेउनि आरत्या करीं । ओवाळूं श्रीमुख वंदूं पाउलें शिरीं । आह्मां दैव आलें येथें घरिच्या घरीं ॥ध्रु.॥ अक्षय मुहूर्त औठामध्यें साधे तें । मग येरी गर्जे जैसें तैसें होत जातें । ह्मणोनि मागें पुढें कोणी न पाहावें येथें । सांडा परतें काम जाऊं हरी सांगातें ॥2॥ बहुतां बहुतां रीतीं चित्तीं धरा हें मनीं । नका गै करूं आइकाल ज्या कानीं । मग हें सुख कधीं न देखाल स्वप्नीं । उरेल हायहाय मागें होइऩल काहाणी ॥3॥ ऐसियास वंचती त्यांच्या अभाग्या पार । नाहीं नाहीं नाहीं सत्य जाणा निर्धार । मग हे वेळ घटिका न ये अजरामर। कळलें असों द्या मग पडतील विचार ॥4॥ जयासाटीं ब्रह्मादिक जालेति पिसे । उिच्छष्टा कारणें देव जळीं जाले मासे । अद्धापगीं विश्वमाता लक्षुमी वसे । तो हा तुकयाबंधु ह्मणे आलें अनायासें ॥5॥ 507 ओवाळूं आरती पंढरीराया । सर्वभावें शरण आलों तुझिया पायां ॥1॥ सर्व व्यापून कैसें रूप आकळ । तो हा गौऑया घरीं जाला कृष्ण बाळ ॥ध्रु.॥ स्वरूप गुणातीत जाला अवतारधारी। तो हा पांडुरंग उभा विटेवरी ॥2॥ भHीचिया काजा कैसा रूपासि आला । िब्रदाचा तोडर चरणीं मिरविला ॥3॥ आरतें आरती ओवािळली । वाखाणितां कीिर्त्त वाचा परतली ॥4॥ भावभिHबळें होसी कृपाळु देवा । तुका ह्मणे पांडुरंगा तुझ्या न कळती मावा ॥5॥ 508 करूनि आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥1॥ आजि पुरले नवस । धन्य जाला हा दिवस ॥ध्रु.॥ पाहा वो सकळा । पुण्यवंता तुह्मी बाळा ॥2॥ तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥3॥ 509 द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥1॥ आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान होतो ॥ध्रु.॥ मोकिळया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी जालिया कृपण । नामाची जतन मग कैची ॥3॥ 510 तुह्मीं जावें निजमंदिरा । आह्मी जातों आपुल्या घरा ॥1॥ विठोबा लोभ असों देइप । आह्मी असों तुमचें पाइप ॥ध्रु.॥ चित्त करी सेवा । आह्मी जातों आपुल्या गावां ॥2॥ तुका ह्मणे दिशा भुलों। फिरोन पायापाशीं आलों ॥3॥ 511 पाहें प्रसादाची वाट । द्यावें धोवोनियां ताट ॥1॥ शेष घेउनि जाइऩन । तुमचें जालिया भोजन ॥ध्रु.॥ जालों एकसवा । तुह्मां आडुनियां देवा ॥2॥ तुका ह्मणे चित्त । करूनि राहिलों नििंश्चत॥3॥ 512 केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आह्मां पोटाची चिंता ॥1॥ बैसा सिणलेती पाय रगडूं दातारा । जाणवूं द्या वारा उब जाली शरीरा ॥ध्रु.॥ उशिरा उशीर किती काय ह्मणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥2॥ तुझिये संगतीं येऊं करूं कोल्हाळ । तुका ह्मणे बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥3॥ 513 कळस वाहियेला शिरीं । सहस्रनामें पूजा करीं ॥1॥ पीक पिकलें पिकलें । घन दाटोनियां आलें ॥ध्रु.॥ शेवटीचें दान । भागा आला नारायण ॥2॥ तुका ह्मणे पोट । भरलें वारले बोभाट ॥3॥ 514 आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बाळकें तूं चि आमुचि आइऩ ॥1॥ देइप गे विठाबाइऩ प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥ध्रु.॥ असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहे कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥2॥ तुका ह्मणे आह्मी तुझीं वेडीं वांकुडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥3॥ 515 आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥1॥ आतां चला जाऊं घरा । नका करूं उजगरा ॥ध्रु.॥ देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥2॥ राग येतो देवा । तुका ह्मणे नेघे सेवा ॥3॥ 516 कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता । बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥1॥ कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं । उतरी पैल पारू भवनदीची ॥ध्रु.॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन । सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥2॥ तुका ह्मणे माझा श्रीकृष्ण विसावा। वाटे न करावा परता जीवा ॥3॥ 517 कृपा करावी भगवंतें । ऐसा शिष्य द्यावा मातें ॥1॥ माझें व्रत जो चालवी । त्यासि द्यावें त्वां पालवी ॥ध्रु.॥ व्हावा ब्रह्मYाानी गुंडा । तिहीं लोकीं ज्याचा झेंडा ॥2॥ तुका तुका हाका मारी । माझ्या विठोबाच्या द्वारीं ॥3॥ 518 जातो वाराणसी । निरवी गाइऩ घोडे ह्मैसी ॥1॥ गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥ नका काढूं माझीं पेवें। तुह्मीं वरळा भूस खावें ॥2॥ भिकारियाचे पाठीं । तुह्मी घेउनि लागा काठी ॥3॥ सांगा जेवाया ब्राह्मण । तरी कापा माझी मान ॥4॥ वोकलिया वोका । म्यां खचिऩला नाहीं रुका ॥5॥ तुह्मीं खावें ताकपाणी । जतन करा तूपलोणी ॥6॥ नाहीं माझें मनीं । पोरें रांडा नागवणी ॥7॥ तुका ह्मणे नीट । होतें तैसें बोले स्पष्ट ॥8॥ 519 कास घालोनी बळकट । झालों किळकाळासी नीट । केली पायवाट । भवसिंधूवरूनि ॥1॥ या रे या रे लाहान थोर । याति भलते नारीनर । करावा विचार । न लगे चिंता कोणासी ॥ध्रु.॥ कामी गुंतले रिकामे । जपी तपी येथें जमे । लाविले दमामे। मुH आणि मुमुक्षा ॥2॥ एकंदर शिका । पाठविला इहलोका । आलों ह्मणे तुका । मी नामाचा धारक ॥3॥ 520 आह्मी वैकुंठवासी । आलों या चि कारणासी । बोलिले जे ॠषी । साच भावें वर्ताव्या ॥1॥ झाडूं संतांचे मारग । आडरानें भरलें जग । उिच्छष्टाचा भाग । शेष उरलें तें सेवूं ॥ध्रु.॥ अथॉ लोपलीं पुराणें । नाश केला शब्दYाानें । विषयलोभी मन । साधनें बुडविलीं ॥2॥ पिटूं भHीचा डांगोरा । किळकाळासी दरारा । तुका ह्मणे करा। जेजेकार आनंदें ॥3॥ 521 बिळयाचे अंकित । आह्मी जालों बिळवंत ॥1॥ लाता हाणोनि संसारा । केला षडूमाअचा मारा ॥ध्रु.॥ जन धन तन । केलें तृणाही समान ॥2॥ तुका ह्मणे आतां । आह्मी मुHीचिया माथां ॥3॥ 522 मृत्युलोकीं आह्मां आवडती परी । नाहीं एका हरिनामें विण ॥1॥ विटलें हें चित्त प्रपंचापासूनि । वमन हें मनीं बैसलेंसे ॥ध्रु.॥ सोनें रूपें आह्मां मृित्तके समान । माणिकें पाषाण खडे तैसे ॥2॥ तुका ह्मणे तैशा दिसतील नारी । रिसाचियापरी आह्मांपुढें ॥3॥ 523 िस्त्रयांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृित्तकेच्या ॥1॥ नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥ दृिष्टमुखें मरण इंिद्रयाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥2॥ तुका ह्मणे जरी अिग्न जाला साधु । परी पावे बाधूं संघट्टणें ॥3॥ 524 पराविया नारी रखुमाइऩसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ॥1॥ जाइप वो तूं माते न करीं सायास । आह्मी विष्णुदास नव्हों तैसे ॥ध्रु.॥ न साहावें मज तुझें हें पतन । नको हें वचन दुष्ट वदों ॥2॥ तुका ह्मणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ॥3॥ 525 भिHप्रतिपाळे दीन वो वत्सळे । विठ्ठले कृपाळे होसी माये ॥1॥ पडिला विसर माझा काय गुणें । कपाळ हें उणें काय करूं ॥2॥ तुका ह्मणे माझें जाळूनि संचित । करीं वो उचित भेट देइप ॥3॥ 526 तुजविण मज कोण वो सोयरें । आणीक दुसरें पांडुरंगे ॥1॥ लागलीसे आस पाहा तुझें वास । रात्री वो दिवस लेखीं बोटीं ॥2॥ काम गोड मज न लगे हा धंदा । तुका ह्मणे सदा हें चि ध्यान ॥3॥ 527 पढियंतें आह्मी तुजपाशीं मागावें । जीवींचें सांगावें हितगुज ॥1॥ पाळसील लळे दीन वो वत्सले । विठ्ठले कृपाळे जननिये ॥ध्रु.॥ जीव भाव तुझ्या ठेवियेला पायीं । तूं चि सर्वा ठायीं एक आह्मां ॥2॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । नाहीं जात घरा आणिकांच्या ॥3॥ सर्वसत्ता एकी आहे तुजपाशीं । ठावें आहे देसी मागेन तें ॥4॥ ह्मणउनि पुढें मांडियेली आळी । थिंकोनियां चोळी डोळे तुका ॥5॥ 528 कोण पर्वकाळ पहासील तीथ । होतें माझें चित्त कासावीस ॥1॥ पाठवीं भातुकें प्रेरीं झडकरी । नको राखों उरी पांडुरंगा ॥ध्रु.॥ न धरावा कोप मजवरी कांहीं । अवगुणी अन्यायी ह्मणोनियां ॥2॥ काय रडवीसी नेणतियां पोरां । जाणतियां थोरां याचिपरी ॥3॥ काय उभी कर ठेवुनियां कटीं । बुझावीं धाकुटीं लडिवाळें ॥4॥ तुका ह्मणे आतां पदरासी पिळा । घालीन निराळा नव्हे मग ॥5॥ 529 कां हो देवा कांहीं न बोला चि गोष्टी । कां मज हिंपुटी करीतसा ॥1॥ कंठीं प्राण पाहें वचनाची आस । तों दिसे उदास धरिलें ऐसें ॥ध्रु.॥ येणें काळें बुंथी घेतलीसे खोल । कां नये विटाळ होऊं माझा ॥2॥ लाज वाटे मज ह्मणवितां देवाचा । न पुससी फुकाचा तुका ह्मणे ॥3॥ 530 उचित तें काय जाणावें दुर्बळें । थोरिवेचें काळें तोंड देवा ॥1॥ देतों हाका कोणी नाइकती द्वारीं । ओस कोणी घरीं नाहींऐसें ॥ध्रु.॥ आलिया अतीता शब्द समाधान । करितां वचन कायवेंचे॥2॥ तुका ह्मणे तुह्मां साजे हें श्रीहरी । आह्मी निलाजिरीं नाहीं ऐसीं ॥3॥ 531 आह्मी मागों ऐसें नाहीं तुजपाशीं । जरीं तूं भीतोसि पांडुरंगा ॥1॥ पाहें विचारूनि आहे तुज ठावें । आह्मी धालों नावें तुझ्या एका ॥ध्रु.॥ ॠिद्धसििद्ध तुझें मुख्य भांडवल । हें तों आह्मां फोल भHीपुढें ॥2॥ तुका ह्मणे जाऊं वैकुंठा चालत । बैसोनि नििंश्चत सुख भोगू ॥3॥ 532 न लगे हें मज तुझें ब्रह्मYाान । गोजिरें सगुण रूप पुरे ॥1॥ लागला उशीर पतितपावना । विसरोनि वचना गेलासि या ॥ध्रु.॥ जाळोनि संसार बैसलों अंगणीं । तुझे नाहीं मनीं मानसीं तें ॥2॥ तुका ह्मणे नको रागेजों विठ्ठला । उठीं देइप मला भेटी आतां ॥3॥ 533 कमोदिनी काय जाणे तो परिमळ । भ्रमर सकळ भोगीतसे ॥1॥ तैसें तुज ठावें नाहीं तुझें नाम । आह्मी च तें प्रेमसुख जाणों ॥ध्रु.॥ माते तृण बाळा दुधाची ते गोडी । ज्याची नये जोडी त्यासी कामा ॥2॥ तुका ह्मणे मुHाफळ शिंपीपोटीं । नाहीं त्याची भेटी भोग तिये ॥3॥ 534 काय सांगों तुझ्या चरणांच्या सुखा । अनुभव ठाउका नाहीं तुज ॥1॥ बोलतां हें कैसें वाटे खरेपण । अमृताचे गुण अमृतासी ॥ध्रु.॥ आह्मी एकएका ग्वाही मायपुतें । जाणों तें निरुतें सुख दोघें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां मोक्षाचा कांटाळा । कां तुह्मी गोपाळा नेणां ऐसें ॥3॥ 535 देखोनियां तुझ्या रूपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥1॥ तेणें माझ्या चित्ता होतें समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥ध्रु.॥ मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥2॥ तुका ह्मणे मज तुझ्या नामापुढें । तुश हें बापुडें सकळी काळ ॥3॥ 536 आतां येणेंविण नाहीं आह्मां चाड । कोण बडबड करी वांयां ॥1॥ सुख तें चि दुःख पुण्यपाप खरें । हें तों आह्मां बरें कळों आलें ॥ध्रु.॥ तुका ह्मणे वाचा वाइऩली अनंता । बोलायाचें आतां काम नाहीं ॥3॥ 537 बोलों अबोलणें मरोनियां जिणें । असोनि नसणें जनि आह्मां ॥1॥ भोगीं त्याग जाला संगीं च असंग । तोडियेले लाग माग दोन्ही ॥2॥ तुका ह्मणे नव्हें दिसतों मी तैसा । पुसणें तें पुसा पांडुरंगा ॥3॥ 538 अधिकार तैसा दावियेले मार्ग । चालतां हें मग कळों येतें ॥1॥ जाळूं नये नाव पावलेनि पार । मागील आधार बहुतांचा ॥2॥ तुका ह्मणे रोग वैदाचे अंगीं । नाहीं करी जगीं उपकार ॥3॥ 539 संवसार तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥1॥ शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनादऩन जगीं होउनि ठेला ॥2॥ तुका ह्मणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥3॥ 540 देहबुिद्ध वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥1॥ तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥2॥ तुका ह्मणे धर्म रक्षाया कारणें । छाया इच्छी उन्हें तापला तो ॥3॥ 541 काळें खादला हा अवघा आकार । उत्पित्तसंहारघडमोडी ॥1॥ वीज तो अंकुर आच्छादिला पोटीं । अनंता सेवटीं एकाचिया ॥2॥ तुका ह्मणे शब्दें व्यापिलें आकाश । गुढार हें तैसें कळों नये ॥3॥ 542 आणीक काळें न चले उपाय । धरावे या पाय विठोबाचे ॥1॥ अवघें चि पुण्य असे तया पोटीं । अवघिया तुटी होय पापा ॥ध्रु.॥ अवघें मोकळें अवघिया काळें । उद्धरती कुळें नरनारी ॥2॥ काळ वेळ नाहीं गर्भवासदुःखें । उच्चारितां मुखें नाम एक ॥3॥ तुका ह्मणे कांहीं न लगे सांडावें । सांगतसें भावें घेती तयां ॥4॥ 543 कां रे माझा तुज न ये कळवळा । असोनि जवळा हृदयस्था ॥1 ॥ अगा नारायणा निष्ठ‍ा निर्गुणा । केला शोक नेणां कंठस्फोट ॥ध्रु.॥ कां हें चित्त नाहीं पावलें विश्रांती । इंिद्रयांची गति कुंटे चि ना ॥2॥ तुका ह्मणे कां रे धरियेला कोप । पाप सरलें नेणों पांडुरंगा ॥3॥ 544 दीनानाथा तुझीं िब्रदें चराचर । घेसील कैवार शरणागता ॥1॥ पुराणीं जे तुझे गर्जती पवाडे । ते आह्मां रोकडे कळों आले ॥ध्रु.॥ आपुल्या दासांचें न साहासी उणें । उभा त्याकारणें राहिलासी ॥2॥ चक्र गदा हातीं आयुधें अपारें । न्यून तेथें पुरें करूं धावें ॥3॥ तुका ह्मणे तुज भHीचें कारण । करावया पूर्ण अवतार ॥4॥ 545 वणूप महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥1॥ ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥ नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥2॥ मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥3॥ तुका ह्मणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥4॥ 546 नाहीं सुख मज न लगे हा मान । न राहे हें जन काय करूं ॥1॥ देहउपचारें पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥ध्रु.॥ नाइकवे स्तुति वाणितां थोरीव । होतो माझा जीव कासावीस ॥2॥ तुज पावें ऐसी सांग कांहीं कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥3॥ तुका ह्मणे आतां करीं माझें हित । काढावें जळत आगींतूनि ॥4॥ 547 न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥1॥ ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणीक लोकांसी हें चि सांगे ॥ध्रु.॥ विटंबो शरीर होत कां विपित्त । परि राहो चित्तीं नारायण ॥2॥ तुका ह्मणे नासिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तें चि हित ॥3॥ 548 पिंड पोसावे हें अधमाचें Yाान । विलास मिष्टान्न करूनियां ॥1॥ शरीर रक्षावें हा धर्म बोलती । काय असे हातीं तयाचिया ॥ध्रु.॥ क्षणभंगुर हें जाय न कळतां । ग्रास गिळी सत्ता नाहीं हातीं ॥2॥ कर्वतिलीं देहें कापियेलें मांस । गेले वनवासा शुकादिक ॥3॥ तुका ह्मणे राज्य करितां जनक । अग्नीमाजी एक पाय जळे ॥4॥ 549 जरी माझी कोणी कापितील मान । तरी नको आन वदों जिव्हे ॥1॥ सकळां इंिद्रयां हे माझी विनंती । नका होऊं परतीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ आणिकांची मात नाइकावी कानीं । आणीक नयनीं न पाहावें ॥2॥ चित्ता तुवां पायीं रहावें अखंडित । होउनी नििश्चत एकविध ॥3॥ चला पाय हात हें चि काम करा । माझ्या नमस्कारा विठोबाच्या ॥4॥ तुका ह्मणे तुह्मां भय काय करी । आमुचा कैवारी नारायण ॥5॥ 550 करिसी तें देवा करीं माझें सुखें । परी मी त्यासी मुखें न ह्मणें संत ॥1॥ जया राज्य द्रव्य करणें उपार्जना । वश दंभमाना इच्छे जाले ॥ध्रु.॥ जगदेव परी निवडीन निराळे । Yाानाचे आंधळे भारवाही ॥2॥ तुका ह्मणे भय न धरीं मानसीं । ऐसियाचे विशीं करितां दंड ॥3॥ 551 ह्मणविती ऐसे आइकतों संत । न देखीजे होत डोळां कोणीं ॥1॥ ऐसियांचा कोण मानितें विश्वास । निवडे तो रस घाइपडाइप ॥ध्रु.॥ पर्जन्याचे काळीं वाहाळाचे नद । ओसरतां बुंद न थारे चि ॥2॥ हि†या ऐशा गारा दिसती दूरोन । तुका ह्मणे घन न भेटे तों ॥3॥ 552 अतिवाद लावी । एक बोट सोंग दावी ॥1॥ त्याचा बहुरूपी नट । नव्हे वैष्णव तो चाट ॥ध्रु.॥ प्रतिपादी वाळी । एक पुजी एका छळी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । भूतदया ज्याचे ठायीं ॥3॥ 553 पोटाचे ते नट पाहों नये छंद । विषयांचे भेद विषयरूप ॥1॥ अथाअ परमार्थ कैसा घडों सके । चित्त लोभी भीके सोंग वांयां ॥ध्रु.॥ देवाचीं चरित्रें दाखविती लीळा । लाघवाच्या कळा मोहावया ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं राहे अभिळास । दोघां नरकवास सारिखा चि ॥3॥ 554 भुंकती तीं द्यावीं भुंकों । आपण त्यांचें नये शिकों ॥1॥ भाविकांनीं दुर्जनाचें । मानूं नये कांहीं साचें ॥ध्रु.॥ होइल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ॥2॥ तुका ह्मणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ॥3॥ 555 जप करितां राग । आला जवळी तो मांग ॥1॥ नको भोंवतालें जगीं । पाहों जवळी राख अंगीं ॥ध्रु.॥ कुडएाची संगती। सदा भोजन पंगती ॥2॥ तुका ह्मणे ब्रह्म । साधी विरहित कर्म ॥3॥ 556 कांहीं च मी नव्हें कोणिये गांवींचा । एकट ठायींचा ठायीं एक ॥1॥ नाहीं जात कोठें येत फिरोनियां । अवघें चि वांयांविण बोलें ॥ध्रु.॥ नाहीं मज कोणी आपुलें दुसरें । कोणाचा मी खरें कांहीं नव्हे ॥2॥ नाहीं आह्मां ज्यावें मरावें लागत । आहों अखंडित जैसे तैसे ॥3॥ तुका ह्मणे नांवरूप नाहीं आह्मां । वेगळा हएा कर्मा अकर्मासी ॥4॥ लोहगावांस परचक्रवेढा पडला - अभंग 3 557 न देखवे डोळां ऐसा हा आकांत । परपीडे चित्त दुःखी होतें ॥1॥ काय तुह्मी येथें नसालसें जालें । आह्मीं न देखिलें पाहिजे हें ॥ध्रु.॥ परचक्र कोठें हरिदासांच्या वासें । न देखिजेत देशें राहातिया ॥2॥ तुका ह्मणे माझी लाजविली सेवा । हीनपणें देवा जिणें जालें ॥3॥ 558 काय म्यां मानावें हरिकथेचें फळ । तरिजे सकळ जनीं ऐसें ॥1॥ उच्छेद तो असे हा गे आरंभला । रोकडें विठ्ठला परचक्र ॥ध्रु.॥ पापाविण नाहीं पाप येत पुढें । साक्षसी रोकडें साक्ष आलें ॥2॥ तुका ह्मणे जेथें वसतील दास । तेथें तुझा वास कैसा आतां ॥3॥ 559 भीत नाहीं आतां आपुल्या मरणा । दुःखी होतां जना न देखवे ॥1॥ आमची तो जाती ऐसी परंपरा । कां तुह्मी दातारा नेणां ऐसें ॥ध्रु.॥ भजनीं विक्षेप तें चि पैं मरण । न वजावा क्षण एक वांयां ॥2॥ तुका ह्मणे नाहीं आघाताचा वारा । ते स्थळीं दातारा ठाव मागें ॥3॥ ॥3॥ 560 फिरंगी वाखर लोखंडाचे विळे । परि ते निराळे गुणमोल ॥1॥ पायरी प्रतिमा एक चि पाषाण । परि तें महिमान वेगळालें ॥2॥ तुका ह्मणे तैशा नव्हतील परी । संतजना सरी सारिखिया ॥3॥ 561 कोण जाणे कोणा घडे उपासना । कोण या वचनाप्रति पावे ॥1॥ आतां माझा श्रोता वHा तूं चि देवा । करावी ते सेवा तुझी च मां ॥ध्रु.॥ कुशळ चतुर येथें न सरते । करितील रिते तर्क मतें ॥2॥ तुका ह्मणे जालें पेणें एके घरीं । मज आणि हरी तुह्मां गांठी ॥3॥ 562 आमचा विनोद तें जगा मरण । करिती भावहीण देखोवेखीं ॥1॥ न कळे सतंत हिताचा विचार । तों हे दारोदार खाती फेरे ॥ध्रु.॥ वंदिलें वंदावें निंदिलें निंदावें । एक गेलें जावें त्याचि वाटा ॥2॥ तुका ह्मणे कोणी नाइके सांगतां । होती यमदूता वरपडे ॥3॥ 563 दीप घेउनियां धुंडिती अंधार । भेटे हा विचार अघटित ॥1॥ विष्णुदास आह्मी न भ्याें किळकाळा । भुलों मृगजळा न घडे तें ॥ध्रु.॥ उधिळतां माती रविकळा मळे । हें कैसें न कळे भाग्यहीना ॥2॥ तुका ह्मणे तृणें झांके हुताशन । हें तंव वचन वाउगें चि ॥3॥ 564 नटनाटएें अवघें संपादिलें सोंग । भेद दाऊं रंग न पालटे ॥1॥ मांडियेला खेळ कौतुक बहुरूप । आपुलें स्वरूप जाणतसों ॥ध्रु.॥ स्फटिकाची शिळा उपाधि न मिळे । भाव दावी पिवळे लाल संगे ॥2॥ तुका ह्मणे आम्ही या जनाविरहित । होऊनि नििंश्चत क्रीडा करूं ॥3॥ 565 तुजविण वाणीं आणिकांची थोरी । तरी माझी हरी जिव्हा झडो ॥1॥ तुजविण चित्ता आवडे आणीक । तरी हा मस्तक भंगो माझा ॥ध्रु.॥ नेत्रीं आणिकांसि पाहीन आवडी । जातु ते चि घडी चांडाळ हे ॥2॥ कथामृतपान न करिती श्रवण । काय प्रयोजन मग यांचें ॥3॥ तुका ह्मणे काय वांचून कारण । तुज एक क्षण विसंबतां ॥4॥ स्वामींचे स्त्रीनें स्वामींस कठिण उत्तरें केलीं - अभंग 7 566 मज चि भोंवता केला येणें जोग । काय याचा भोग अंतरला ॥1॥ चालोनियां घरा सर्व सुखें येती । माझी तों फजीती चुके चि ना ॥ध्रु.॥ कोणाची बाइऩल होऊनियां वोढूं । संवसारीं काढूं आपदा किती ॥2॥ काय तरी देऊं तोडितील पोरें । मरतीं तरी बरें होतें आतां ॥3॥ कांहीं नेदी वांचों धोवियेलें घर । सारवावया ढोर शेण नाहीं ॥4॥ तुका ह्मणे रांड न करितां विचार । वाहुनियां भार कुंथे माथां ॥5॥ 567 काय नेणों होता दावेदार मेला । वैर तो साधिला होउनि गोहो ॥1॥ किती सर्वकाळ सोसावें हें दुःख । किती लोकां मुख वासूं तरीं ॥ध्रु.॥ झवे आपुली आइऩ काय माझें केलें । धड या विठ्ठलें संसाराचें ॥2॥ तुका ह्मणे येती बाइऩले असडे । काुंफ्दोनियां रडे हांसे कांहीं ॥3॥ 568 गोणी आली घरा । दाणे खाऊं नेदी पोरा ॥1॥ भरी लोकांची पांटोरी । मेला चोरटा खाणोरी ॥ध्रु.॥ खवळली पिसी । हाता झोंबे जैसी लांसी ॥2॥ तुका ह्मणे खोटा । रांडे संचिताचा सांटा ॥3॥ 569 आतां पोरा काय खासी । गोहो जाला देवलसी ॥1॥ डोचकें तिंबी घातल्या माळा । उदमाचा सांडी चाळा ॥ध्रु.॥ आपल्या पोटा केली थार । आमचा नाहीं येसपार ॥2॥ हातीं टाळ तोंड वासी। गाय देउळीं । देवापासीं ॥3॥ आतां आह्मी करूं काय । न वसे घरीं राणा जाय ॥4॥ तुका ह्मणे आतां धीरी । आझुनि नाहीं जालें तरी ॥5॥ 570 बरें जालें गेलें । आजी अवघें मिळालें ॥1॥ आतां खाइऩन पोटभरी । ओल्या कोरडएा [[भाकरी]] ॥ध्रु.॥ किती तरी तोंड। याशीं वाजवूं मी रांड ॥2॥ तुका बाइले मानवला । चीथू करूनियां बोला ॥3॥ 571 न करवे धंदा । आइता तोंडीं पडे लोंदा ॥1॥ उठितें तें कुटितें टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥ध्रु.॥ जिवंत चि मेले। लाजा वाटुनियां प्याले ॥2॥ संसाराकडे । न पाहाती ओस पडे ॥3॥ तळमळती यांच्या रांडा । घालिती जीवा नांवें धोंडा ॥4॥ तुका ह्मणे बरें जालें । घे गे बाइले लीहिलें ॥5॥ 572 कोण घरा येतें आमुच्या काशाला । काय ज्याचा त्याला नाहीं धंदा ॥1॥ देवासाटीं जालें ब्रह्मांड सोइरें । कोमऑया उत्तरें काय वेचे ॥ध्रु.॥ मानें पाचारितां नव्हे आराणुक । ऐसे येती लोक प्रीतीसाटीं ॥2॥ तुका ह्मणे रांडे नावडे भूषण । कांतेलेंसें श्वान पाठीं लागे ॥3॥ ॥7॥ 573 भाव धरी तया तारील पाषाण । दुर्जना सज्जन काय करी ॥1॥ करितां नव्हे नीट श्वानाचें हें पुंस । खापरा परीस काय करी ॥ध्रु.॥ काय करिल तया साकरेचें आळें । बीज तैसीं फळें येती तया ॥2॥ तुका ह्मणे वज्र भंगे एक वेळ । कठीण हा खळ तयाहूनी ॥3॥ 574 इच्छावें तें जवळी आलें । काय बोलें कारण ॥1॥ नामरूपीं पडिली गांठी । अवघ्या गोष्टी सरल्या ॥ध्रु.॥ मुकियाचे परी जीवीं । साकर जेवों खादली ॥2॥ तुका ह्मणे काय बोलें । आतां भलें मौन्य ची ॥3॥ 575 साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥1॥ परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥ देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥2॥ तुका ह्मणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥3॥ 576 आह्मासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥1॥ मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥ कोठें न दिसे पाहतां। उडी घाली अवचिता ॥2॥ सुख ठेवी आह्मासाठीं । दुःख आपणची घोंटी ॥3॥ आह्मां घाली पाठीकडे । पुढें किळकाळाशीं भिडे ॥4॥ तुका ह्मणे कृपानीधी । आह्मां उतरीं नांवेमधीं ॥5॥ 577 रवि रिश्मकळा । नये काढितां निराळा ॥1॥ तैसा आह्मां जाला भाव । अंगीं जडोनि ठेला देव ॥ध्रु.॥ गोडी साकरेपासुनी। कैसी निवडती दोन्ही ॥2॥ तुका ह्मणे नाद उठी । विरोनि जाय नभा पोटीं ॥3॥ 578 थोडें परी निरें । अविट तें घ्यावें खरें ॥1॥ घ्यावें जेणें नये तुटी । बीज वाढे बीजा पोटीं ॥ध्रु.॥ चित्त ठेवीं ग्वाही । आणिकांशीं चाड नाहीं ॥2॥ आपलें तें हित फार । तुका ह्मणे खरें सार ॥3॥ 579 अवघे देव साध । परी या अवगुणांचा बाध ॥1॥ ह्मणउनी नव्हे सरी । राहे एका एक दुरी ॥ध्रु.॥ ऊंस [[कांदा]] एक आळां । स्वाद गोडीचा निराळा ॥2॥ तुका ह्मणे नव्हे सरी । विष अमृताची परी ॥3॥ 580 शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥1॥ ह्मणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥ खवळलिया कामक्रोधीं। अंगी भरती आधिव्याधी ॥2॥ ह्मणे त्रिविध ताप । जाती मग आपेंआप ॥3॥ 581 गोडीपणें जैसा गुळ । तैसा देव जाला सकळ ॥1॥ आतां भजों कवणे परी । देव सबाहए अंतरीं ॥ध्रु.॥ उदका वेगळा। नव्हे तरंग निराळा ॥2॥ हेम अळंकारा नामीं । तुका ह्मणे तैसे आह्मी ॥3॥ 582 परमेिष्ठपदा । तुच्छ करिती सर्वदा ॥1॥ हें चि ज्यांचें धन । सदा हरीचें स्मरण ॥ध्रु.॥ इंद्रपदादिक भोग । भोग नव्हे तो भवरोग ॥2॥ सार्वभौमराज्य । त्यांसि कांहीं नाहीं काज ॥3॥ पाताळींचें आधिपत्य । ते तों मानिती विपत्य ॥4॥ योगसििद्धसार। ज्यासि वाटे तें असार ॥5॥ मोक्षायेवढें सुख । सुख नव्हे चि तें दुःख ॥6॥ तुका ह्मणे हरीविण । त्यासि अवघा वाटे सिण ॥7॥ 583 मोहो†याच्या संगें । सुत नव्हे आगीजोगें ॥1॥ नाहीं तरी त्याचें भक्ष । काय सांगणें ते साक्ष ॥ध्रु.॥ स्वामीचिया अंगें । रूप नव्हे कोणाजोगें ॥2॥ तुका ह्मणे खोडी । देवमणी न देती दडी ॥3॥ 584 मजसवें नको चेष्टा । नव्हे साळी कांहीं कोष्टा ॥1॥ बैस सांडोनि दिमाख । जाय काळें करीं मुख ॥ध्रु.॥ येथें न सरे चार। हीण आणीक वेव्हार ॥2॥ तुका विष्णुदास । रस जाणतो नीरस ॥3॥ 585 भाव देवाचें उचित । भाव तोचि भगवंत ॥1॥ धन्यधन्य शुद्ध जाती । संदेह कैंचा तेथें चित्तीं ॥ध्रु.॥ बहुत बराडी । देवजवळी आवडी ॥2॥ तुका ह्मणे हें रोकडें । लाभ अधिकारी चोखडे ॥3॥ 586 गौरव गौरवापुरतें । फळ सत्याचे संकल्प ॥1॥ कठिण योगाहुनि क्षम । ओकलिया होतो श्रम ॥ध्रु.॥ पावलें मरे सिवेपाशीं। क्लेश उरत ते क्लेशीं ॥2॥ तुका ह्मणे बहु आणी । कठिण निघालिया रणीं ॥3॥ 587 न संडी अवगुण । वर्में मानीतसे सिण ॥1॥ भोग देतां करिती काइऩ । फुटतां यमदंडें डोइऩ ॥ध्रु.॥ पापपुण्यझाडा । देतां तेथें मोटी पीडा ॥2॥ तुका ह्मणे बोला । माझ्या सिणती विठ्ठला ॥3॥ 588 पावे ऐसा नाश । अवघियां दिला त्रास ॥1॥ अविटाचा केला संग । सर्व भोगी पांडुरंग ॥ध्रु.॥ आइता च पाक । संयोगाचा सकिळक ॥2॥ तुका ह्मणे धणी । सीमा राहिली होऊनी ॥3॥ 589 दुर्बळ हें अवघें जन । नारायणीं विमुख ॥1॥ झाडोनियां हात जाती । पात्र होतीं दंडासी ॥ध्रु.॥ सिदोरी तें पापपुण्य । सवेंसिण भिकेचा ॥2॥ तुका ह्मणे पडिला वाहो । कैसा पाहा हो लटिक्याचा ॥3॥ 590 वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥1॥ जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥ काळा नाहीं वाव । परा श्रमा कोठें ठाव ॥2॥ तुका ह्मणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥3॥ 591 झाड कल्पतरू । न करी याचकीं आव्हेरू ॥1॥ तुह्मी सवाअ सवाौत्तम । ऐसे विसरतां धर्म ॥ध्रु.॥ परिसा तुमचें देणें । तो त्या जागे अभिमानें ॥2॥ गा†हाण्यानें तुका । गर्जे मारुनियां हाका ॥3॥ 592 वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥1॥ संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥. संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥2॥ तुका ह्मणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥3॥ 593 येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥1॥ घरीं देवाचे अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥. नाहीं पाहावें लागत। एकाएकीं च ते रित ॥2॥ तुका ह्मणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥3॥ 594. करितां देवार्चन । घरा आले संतजन ॥1॥ देव सारावे परते । संत पूजावे आरते ॥ध्रु.॥. शािळग्राम विष्णुमूर्ती । संत हो का भलते याती ॥2॥ तुका ह्मणे संधी । अधिक वैष्णवांची मांदी ॥3॥ 595. ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ॥1॥ करितां स्वामीसवें वाद । अधिक अधिक आनंद ॥ध्रु.॥. असावा तो धर्म । मग साहों जातें वर्म ॥2॥ वदे वाग्देवी । तुका विठ्ठली गौरवी ॥3॥ 596. देवें जीव धाला । संसार तो कडू झाला ॥1॥ ते चि येतील ढेंकर । आनंदाचे हरिहर ॥ध्रु.॥. वेधी आणिकांस । ऐसा जया अंगीं कस ॥2॥ तुका ह्मणे भुक । येणें न लगे आणीक ॥3॥ 597. नाम साराचें ही सार । शरणागत यमकिंकर ॥1॥ उतमातम । वाचे बोला पुरुषोत्तम ॥ध्रु.॥. नाम जपतां चंद्रमौळी । नामें तरला वाल्हा कोळी ॥2॥ तुका म्हणे वणूप काय । तारक विठोबाचे पाय ॥3॥ 598. गातों भाव नाहीं अंगीं । भूषण करावया जगीं ॥1॥ परि तूं पतितपावन । करीं साच हें वचन ॥ध्रु.॥. मुखें ह्मणवितों दास । चित्तीं माया लोभ आस ॥5॥ तुका ह्मणे दावीं वेश । तैसा अंतरीं नाहीं लेश ॥3॥ 599. द्रव्य असतां धर्म न करी । नागविला राजद्वारीं ॥1॥ माय त्यासि व्याली जेव्हां । रांड सटवी नव्हती तेव्हां ॥ध्रु.॥. कथाकाळीं निद्रा लागे । कामीं श्वानापरी जागे ॥2॥ भोग िस्त्रयेसि देतां लाजे । वस्त्र दासीचें घेउनि निजे ॥3॥ तुका ह्मणे जाण । नर गाढवाहुनी हीन ॥4॥ 600. मुखें बोले ब्रह्मYाान । मनीं धनअभिमान ॥1॥ ऐशियाची करी सेवा । काय सुख होय जीवा ॥ध्रु.॥. पोटासाठीं संत । झाले कलींत बहुत ॥2॥ विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी ॥3॥ [[वर्ग:गाथा]] 9h8420z0fm9gs8zti171urfjk0hiymd तुकाराम गाथा/ ६०१ ते ९०० 0 1535 36912 36888 2026-09-19T19:42:51Z QueerEcofeminist 1879 Restored revision 4995 by [[Special:Contributions/Mahitgar|Mahitgar]] ([[en:w:User:BrandonXLF/Restorer|Restorer]]) 36912 wikitext text/x-wiki [[Category:Transferable to Marathi Wikisource]] 601 एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥1॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥ अनुतापें स्नानविधि । यYासििद्ध देहहोम ॥2॥ जीवशिवा होतां चुका । तेथें तुका विनटला ॥3॥ 602 त्रैलोक्य पािळतां उबगला नाहीं । आमचें त्या काइऩ असे ओझें ॥1॥ पाषाणाचे पोटीं बैसला ददुऩर । तया मुखीं चार कोण घाली ॥ध्रु.॥ पक्षी अजगर न करी संचित । तयासि अनंत प्रतिपाळी ॥2॥ तुका ह्मणे तया भार घातलिया । उपेक्षीना दयासिंधु माझा ॥3॥ 603 बोली मैंदाची बरवी असे । वाटे अंतरीं घालावे फांसे ॥1॥ कैसा वरिवरि दिसताहे चांग । नव्हे भाविक केवळ मांग ॥ध्रु.॥ टिळा टोपी माळा कंठीं । अंधारीं नेउनि चेंपी घांटी ॥2॥ तुका ह्मणे तो केवळ पुंड । त्याजवरी यमदंड ॥3॥ 604 दोष पळती कीर्तनें । तुझ्या नामें संकीर्तनें ॥1॥ हें कां करूं आदरिलें । खोटें वचन आपुलें ॥ध्रु.॥ तुह्मी पापा भीतां । आह्मां उपजावया चिंता ॥2॥ तुका ह्मणे सेवा । किळकाळा जिंकी देवा ॥3॥ 605 करा नारायणा । माझ्या दुःखाची खंडणा ॥1॥ वृित्त राखा पायांपाशीं । वस्ती धरूनि मानसीं ॥ध्रु.॥ पाळोनियां लळा । आतां पाववावें फळा ॥2॥ तुका ह्मणे दीनें । त्यांचा हरतिया सीण ॥3॥ 606 मी तों दीनाहूनि दीन । माझा तूज अभिमान ॥1॥ मी तों आलों शरणागत । माझें करावें स्वहित ॥ध्रु.॥ दिनानाथा कृपाळुवा। सांभाळावें आपुल्या नांवा ॥2॥ तुका ह्मणे आतां । भलें नव्हे मोकलितां ॥3॥ 607 सुख वाटे तुझे वणिऩतां पवाडे । प्रेम मिठी पडे वदनासी ॥1॥ व्याले दोन्ही पक्षी एका वृक्षावरी । आला दुराचारी पारधी तो ॥ध्रु.॥ वृक्षाचिया माथां सोडिला ससाना । धनुष्यासि बाणा लावियेलें ॥2॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । धांवें गा श्रीपती मायबापा ॥3॥ उडोनियां जातां ससाना मारील । बैसतां विंधील पारधी तो ॥4॥ ऐकोनियां धांवा तया पिक्षयांचा । धरिला सर्पाचा वेश वेगीं ॥5॥ डंखोनि पारधी भुमीसि पाडिला । बाण तो लागला ससान्यासी ॥6॥ ऐसा तूं कृपाळु आपुलिया दासा । होसील कोंवसा संकटींचा ॥7॥ तुका ह्मणे तुझी कीतिऩ त्रिभुवना । वेदाचिये वाणी वर्णवेना ॥8॥ 608 नाही दुकळलों अन्ना । परि या मान जनादऩना ॥1॥ देव केला सकळसाक्षी । काळीं आणि शुद्धपक्षीं ॥ध्रु.॥ भोगी भोगविता। बाळासवें तो चि पिता ॥2॥ कर्म अकर्म जळालें । प्रौढें तुका तें उरले ॥3॥ नाटाचे अभंग समाप्त 63 609 प्रथम नमन तुज एकदंता । रंगीं रसाळ वोडवीं कथा। मति सौरस करीं प्रबळता । जेणें फिटे आतां अंधकार ॥1॥ तुझिये कृपेचें भरितें । आणीक काय राहिलें तेथें । मारग सिद्धाच्यानि पंथें। पावविसी तेथें तूं चि एक ॥ध्रु.॥ आरंभा आदि तुझें वंदन । सकळ करितां कारण । देव ॠषि मुनि आदिकरुन । ग्रंथ पुराण निर्माणी ॥2॥ काय वणूप तुझी गती । एवढी कैची मज मती । दिनानाथ तुज ह्मणती । करी । करीं सत्य वचन हें चि आपुलें ॥3॥ मज वाहावतां मायेच्या पुरीं । बुडतां डोहीं भवसागरीं । तुज वांचुनि कोण तारी । पाव झडकरी तुका ह्मणे ॥4॥ 610 प्रथमारंभीं लंबोदर । सकळ सिद्धींचा दातार । चतुर्भुज फरशधर । न कळे पार वणिऩतां ॥1॥ तो देव नटला गौरीबाळ । पायीं बांधोनि घाग†या घोळ । नारदतुंबरसहित मेळ । सुटला पळ विघ्नांसी ॥2॥ नटारंभी थाटियला रंग । भुजा नाचवी हालवी अंग। सेंदुरविलेपनें चांग । मुगुटीं नाग मिरविला ॥3॥ जया मानवतीदेव ॠषि मुनी । पाहातां न पुरें डोिळयां धनी । असुर जयाच्या चरणीं। आदीं अवसानीं तो चि एक ॥4॥ सकळां सिद्धींचा दातार । जयाच्या रूपा नाहीं पार । तुका ह्मणे आमुचा दातार । भवसागर तारील हा ॥5॥ 611 विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥1॥ विठ्ठल कुळींचें दैवत। विठ्ठल वित्त गोत । विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥2॥ विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी । विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥3॥ विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा । विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥4॥ विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता । विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका ह्मणे आतां नाहीं दुसरें ॥5॥ 612 बरवा झाला वेवसाव । पावलों चिंतिला चि ठाव । दृढ पायीं राहिला भाव । पावला जीव विश्रांती ॥1॥ बरवा फळला शकुन । अवघा निवारिला सिण । तुमचें जालिया दरुषण । जन्ममरण नाहीं आता ॥ध्रु.॥ बरवें जालें आलों या ठाया । होतें संचित ठायींच पाया । देहभाव पालटली काया । पडली छाया ब्रह्मींची ॥2॥ जोडिलें न सरे हें धन । अविनाश आनंदघन । अमूर्तमूतिऩ मधुसूदन। सम चरण देखियेले ॥3॥ जुनाट जुगादिचें नाणें । बहुता काळाचें ठेवणें । लोपलें होतें पारिखेपणें । ठावचळण चुकविला ॥4॥ आतां या जीवाचियासाठीं । न सुटे पडलिया मिठी। तुका ह्मणे सिणलों जगजेठी । न लगो दिठी दुस†याची ॥5॥ 613 मी तंव अनाथ अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी । तुज म्यां आठविलें नाहीं कधीं । वाचे कृपानीधी मायबापा ॥1॥ नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित । नावडे पुराण बैसले संत । केली बहुत परनिंदा ॥ध्रु.॥ केला करविला नाहीं उपकार। नाहीं दया आली पीडितां पर । करू नये तो केला व्यापार। वाहिला भार कुटुंबाचा ॥2॥ नाही केलें तीर्थाचें भ्रमण । पािळला पिंड करचरण । नाहीं संतसेवा घडलें दान । पूजावलोकन मुर्तीचें ॥3॥ असंगसंग घडले अन्याय । बहुत अधर्म उपाय । न कळे हित करावें तें काय । नये बोलूं आठवूं तें ॥4॥ आप आपण्या घातकर। शत्रु जालों मी दावेदार । तूं तंव कृपेचा सागर। उतरीं पार तुका ह्मणे ॥5॥ 614 आतां पावन सकळ सुखें । खादलें कदा तें नखें । अवघे सरलें पारिखें । सकळ देखें माहियरें ॥1॥ जवळी विठ्ठल रखुमाइऩ । बहिणी बंधु बाप आइऩ । सकळ गोताची च साइऩ । पारिखें काइप ऐसें नेणिजे ॥ध्रु.॥ जगदाकारीं जाली सत्ता । वारोनी गेली पराधीनता । अवघे आपुलें चि आतां । लाज आणि चिंता दु†हावली ॥2॥ वावरे इच्छा वसे घरीं । आपुले सत्तेचे माहेरीं । करवी तैसें आपण करी । भीड न घरी चुकल्याची ॥3॥ सोसिला होता सासुरवास। बहुतांचा बहुत दिवस । बहु कामें पुरविला सोस । आतां उदास आपुल्यातें ॥4॥ करिती कवतुक लाडें । मज बोलविती कोडें । मायबाप उत्तरें गोडें । बोेले बोबडें पुढें तुका ॥5॥ 615 सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुHी यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेिष्टला जीव माझा ॥1॥ माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥ काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥2॥ मज चालतां प्रयाणकाळीं। असतां न दिसती जवळी । मृित्तके मृित्तका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥3॥ आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥4॥ 616 अगा ए सावऑया सगुणा । गुणनिधिनाम नारायणा । आमची परिसा विYाापना । सांभाळी दीना आपुलिया ॥1॥ बहु या उदराचे कष्ट । आह्मांसि केलें कर्मभ्रष्ट । तुमची चुकविली वाट । करीं वटवट या निमित्यें ॥ध्रु.॥ जालों पांगिला जनासी । संसाराची आंदणी दासी । न कळे कधीं सोडविसी । दृढपाशीं बहु बांधलों ॥2॥ येथें तों नये आठव कांहीं । विसावा तो क्षण एक नाहीं । पडिलों आणिके प्रवाहीं । हित तों कांहीं दिसे चि ना ॥3॥ जीवित्व वेचलों वियोगें । हिंडतां प्रवास वाउगें । कांहीं व्याधि पीडा रोगें । केलिया भोगें तडातोडी ॥4॥ माझा मीं च जालों शत्रु । कैचा पुत्र दारा कैचा मित्रु । कासया घातला पसरु । अहो जगद्ग‍ु तुका ह्मणे ॥5॥ 617 आतां मज धरवावी शुिद्ध । येथुनी परतवावी बुिद्ध । घ्यावें सोडवुनि कृपानिधि । सांपडलों संधीं काळचक्रीं ॥1॥ करिसील तरि नव्हे काइऩ । राइऩचा डोंगर पर्वत राइऩ । आपुले करुणेची खाइऩ। करीं वो आइऩ मजवरी ॥ध्रु.॥ मागील काळ अYाानपणें । सरला स्वभावें त्या गुणें । नेणे आयुष्य जालें उणें । पुढील पेणें अंतरलें ॥2॥ आतां मज वाटतसे भय । दिवसेंदिवस चालत जाय । येथें म्या येउनि केलें काय । नाहीं तुझे पाय आठविले ॥3॥ करूनि अपराध क्षमा । होतील केले पुरुषोत्तमा । आपुले नामीं घ्यावा प्रेमा। सोडवीं भ्रमापासुनिया ॥4॥ हृदय वसो तुमच्या गुणीं । ठाव हा पायांपें चरणीं । करूं हा रस सेवन वाणी । फिटे तों धणी तुका ह्मणे ॥5॥ 618 जेणें हा जीव दिला दान । तयाचें करीन चिंतन । जगजीवन नारायण । गाइऩन गुण तयाचे ॥1॥ जो या उभा भीवरेच्या तिरीं । कट धरूनियां करीं । पाउलें सम चि साजिरीं । अंतरीं धरोनि राहेन ॥ध्रु.॥ जो या असुरांचा काळ । भHजनप्रतिपाळ । खेळे हीं लाघवें सकळ । तयाच्या भाळ पायांवरी ॥2॥ जो या गोपाळांच्या मेळीं । खेळु खेळे वनमाळी । रसातळा नेला बळी । राहे पाताळीं स्वामी माझा ॥3॥ जो हा लावण्यपुतळा । जयाचे अंगीं सकळ कळा । जयाचे गळां वैजयंतीमाळा । तया वेळोवेळां दंडवत ॥4॥ जयाचे नाम पाप नासी । लIमी ऐसी जयाची दासी । जो हा तेजोपुंज्यरासी । सर्वभावें त्यासि तुका शरण ॥5॥ 619 काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण । ऐसें तुह्मी सांगा संतजन । करा समाधान चित्त माझें ॥1॥ काय हें खंडइऩल कर्म । पारुषतील धर्माधर्म । कासयानें तें कळे वर्म । ह्मणउनी श्रम वाटतसे ॥ध्रु.॥ काय हो िस्थर राहेल बुद्धी । कांहीं अरिष्ट न येल मधीं । धरिली जाइऩल ते शुद्धी । शेवट कधीं तो मज न कळे ॥2॥ काय ऐसें पुण्य होइऩल गांठीं । घालीन पायीं देवाचे मिठी । मज तो कृवाळील जगजेठी । दाटइन कंठीं सद्गदित ॥3॥ काय हे निवतील डोळे । सुख तें देखोनी सोहळे । संचित कैसें तें न कळे । होतील डोहळे वासनेसी ॥4॥ ऐसी चिंता करीं सदा सर्वकाळ । रात्रिदिवस तळमळ । तुका ह्मणे नाहीं आपुलें बळ । जेणें फळ पावें निश्चयेंसी ॥5॥ 620 तूंचि अनाथाचा दाता । दुःख मोह नासावया चिंता । शरण आलों तुज आतां । तारीं कृपावंता मायबापा ॥1॥ संतसंगति देइप चरणसेवा । जेणें तुझा विसर न पडावा । हा च भाव माझिया जीवा । पुरवीं देवा मनोरथ ॥2॥ मज भाव प्रेम देइऩ कीर्ती । गुण नाम वर्णावया स्तुती । विघ्नां सोडवूनि हातीं । विनंती माझी परिसावी हे ॥3॥ आणीक कांहीं नाहीं मागणें । सुखसंपित्तराज्यचाड धन । सांकडें न पडे तुज जेणें । दुजें भHीविण मायबापा ॥4॥ जोडोनियां कर पायीं ठेवीं माथा । तुका विनवी पंढरिनाथा । रंगीं वोडवावी रंगकथा । पुरवीं व्यथा मायबापा ॥5॥ 621 सेंदरीं हें देवी दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥1॥ आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देइऩल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुिद्ध अधरा ॥ध्रु.॥ दासीचा पाहुनरउखतें। धणी देइऩल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शिHहीन ॥2॥ काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥3॥ विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड। ऐसियास भांड ह्मणे देव तो ॥4॥ तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनादऩनष । तुका ह्मणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥5॥ 622 विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥1॥ कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥ बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें जालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होइऩल भेटी जन्मासी ॥2॥ जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारंबळे भूकतान ॥3॥ एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य। न करिती नित्य नामस्मरण ॥4॥ तुका ह्मणे न वेंचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचितां फुकाचे चि बोल। केवढें खोल अभागिया ॥5॥ 623 आले हो संसारा तुह्मी एक करा । मुिHमारग हळू चि धरा । काळदंड कुंभयातना थोरा । कां रे अघोरा देखसी ना ॥1॥ नाहीं त्या यमासि करुणा । बाहेर काढितां कुडी प्राणा । ओढाळ सांपडे जैं धान्या । चोर यातना धरिजेतां ॥2॥ नाहीं दिलें पावइल कैसा । चालतां पंथ तेणें वळसा । नसेल ठाउकें ऐकतो कैसा । नेती बंद जैसा धरोनियां ॥3॥ क्षण एक नागीवा पायीं । न चलवे तया करितां कांहीं । वोढितां कांटवणा सोइप । अिग्नस्तंभीं बाही कवटाळविती ॥4॥ देखोनि अंगें कांपती । तये नदीमाजी चालविती। लागे ठाव न लगे बुडविती । वरि मारिती यमदंड ॥5॥ तानभूक न साहावे वेळ । तो राखिती कितीएक काळ । पिंड पाळूनि कैसा सीतळ । तो तप्तभूमीं ज्वाळ लोळविती ॥6॥ ह्मणउनी करा कांहीं सायास । व्हावेल तर व्हा रे उदास । करवेल तर करा नामघोष । सेवा भिHरस तुका ह्मणे ॥7॥ 624 न बोलसी तें ही कळलें देवा । लाजसी आपुलिया नांवा। तुज मी नाहीं घालीत गोवा । भीड केशवा कासयाची ॥1॥ उतरीं आपुला हा पार । मजशीं बोलोनि उत्तर । माझा तुज नव्हे अंगीकार । मग विचार करीन मी ॥2॥ दात्या आणि मागत्यासी । धर्मनीति तरी बोलिली ऐसी । यथानशिH टाकेल तैसी । बाधी दोघांसी विन्मुखता ॥3॥ ह्मणोनि करितों मी आस । तुझिया वचनाची वास । धीर हा करूनि सायास । न टळें नेमास आपुलिया ॥4॥ तुझें म्यां घेतल्या वांचून । न वजें एथूनि वचन । हा चि माझा नेम सत्य जाण । आहे नाहीं ह्मणे तुका ह्मणे ॥5॥ 625 आतां मी न पडें सायासीं । संसारदुःखाचिये पाशीं । शरण रिघेन संतांसी । ठाव पायांपाशीं मागेन त्यां ॥1॥ न कळे संचित होतें काय । कोण्या पुण्यें तुझे लाधती पाय । आतां मज न विसंबें माय । मोकलूनि धाय विनवीतसें ॥2॥ बहुत जाचलों संसारें । मोहमायाजाळाच्या विखारें । त्रिगुण येतील लहरें । तेणें दुःखें थोरें आक्रंदलों ॥3॥ आणीक दुःखें सांगों मी किती । सकळ संसारिस्थती । न साहे पाषाण फुटती । भय चित्तीं कांप भरलासे ॥4॥ आतां मज न साहवे सर्वथा । संसारगंधीची हे वार्ता । जालों वेडा असोनि जाणता । पावें अनंता तुका ह्मणे ॥5॥ 626 आतां तुज कळेल तें करीं । तारिसी तरि तारीं मारीं । जवळी अथवा दुरी धरीं । घाली संसारीं अथवा नको ॥1॥ शरण आलों नेणतपणें । भाव आणि भिH कांहीं च नेणें । मतिमंद सर्वYाानें । बहु रंक उणें रंकाहुनी ॥ध्रु.॥ मन िस्थर नाहीं माझिये हातीं। इंिद्रयें धांवतां नावरती । सकळ खुंटलिया युHी । शांति निवृित्त जवळी नाहीं ॥2॥ सकळ निवेदिला भाव । तुझिये पायीं ठेविला जीव । आतां करीं कळे तो उपाव । तूं चि सर्व ठाव माझा देवा ॥3॥ राहिलों धरूनि विश्वास । आधार नेटीं तुझी कास । आणीक नेणें मी सायास । तुका ह्मणे यास तुझें उचित ॥4॥ 627 देवा तूं कृपाकरुणासिंधु । होसी मायबाप आमचा बंधु। जीवनसििद्ध साधनसिंधु । तोडिसी भवबंधु काळपाश ॥1॥ शरणागता वज्रपंजर । अभयदाना तूं उदार । सकळां देवां तूं अगोचर । होसी अविकार अविनाश ॥ध्रु.॥ भागली स्तुति करितां फार । तेथें मी काय तें गव्हार । जाणावया तुझा हा विचार । नको अंतर देऊं आतां ॥2॥ नेणें भाव परि ह्मणवीं तुझा । नेणें भिH परि करितों पूजा । आपुल्या नामाचिया काजा । तुज केशीराजा लागे धांवणें ॥3॥ तुझिया बळें पंढरीनाथा । जालों निर्भर तुटली व्यथा । घातला भार तुझिया माथां। न भीं सर्वथा तुका ह्मणे ॥4॥ 628 कोण सुख धरोनि संसारीं । राहों सांग मज बा हरी । अवघ्या नाशिवंता परी । थिता दुरी अंतरसी ॥1॥ प्रथम केला गभाअ वास । काय ते सांगावे सायास । दुःख भोगिलें नव ही मास । आलों जन्मास येथवरी ॥2॥ बाळपण गेलें नेणतां । तारुण्यदशे विषयव्यथा। वृद्धपणीं प्रवर्तली चिंता । मरें मागुता जन्म धरीं ॥3॥ क्षण एक तो ही नाहीं विसावा । लक्ष चौ†याशीं घेतल्या धांवा । भोवंडिती पाठीं लागल्या हांवा । लागो आगी नांवा माझ्या मीपणा ॥4॥ आतां पुरे ऐसी भरोवरी । रंक होऊनि राहेन द्वारीं । तुझा दास मी दीन कामारी। तुका ह्मणे करीं कृपा आतां ॥5॥ 629 सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥1॥ ह्मणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥2॥ ऐसा हा कळला निर्धार। मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाहए अभ्यंतर मजजवळा ॥3॥ दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुिHमुिH जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आह्मांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥4॥ जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आह्मां आनंदास । सेवूं ब्रह्मरस तुका ह्मणे ॥5॥ 630 देवा तूं आमचा कृपाळ । भिHप्रतिपाळ दीनवत्सळ । माय तूं माउली स्नेहाळ । भार सकळ चालविसी ॥1॥ तुज लागली सकळ चिंता । राखणें लागे वांकडें जातां । पुडती निरविसी संतां । नव्हे विसंबतां धीर तुज ॥2॥ आह्मां भय चिंता नाहीं धाक जन्म मरण कांहीं एक । जाला इहलोकीं परलोक । आलें सकळैकवैकुंठ ॥3॥ न कळे दिवस कीं राती । अखंड लागलीसे ज्योती । आनंदलहरीची गती । वणूऩ कीर्ती तया सुखा ॥4॥ तुझिया नामाचीं भूषणें । तों यें मज लेवविलीं लेणें । तुका ह्मणे तुझियान गुणें । काय तें उणें एक आह्मां ॥5॥ 631 न पवे सन्निध वाटते चिंता । वरि या बहुतांची सत्ता । नुगवे पडत जातो गुंता । कर्मा बिळवंता सांपडलों ॥1॥ बहु भार पडियेला शिरीं । मी हें माझें मजवरी । उघडएा नागविलों चोरीं । घरिच्याघरीं जाणजाणतां ॥ध्रु.॥ तुज मागणें इतुलें आतां । मज या निरवावें संतां । जाला कंठस्फोट आळवितां । उदास आतां न करावें ॥2॥ अति हा निकट समय । मग म्यां करावें तें काय । दिवस गेलिया टाकइऩल छाय । उरइऩल हाय रातिकाळीं ॥3॥ होइऩल संचिताची सत्ता। अंगा येइऩल पराधीनता । ठाव तो न दिसे लपतां। बहुत चिंता प्रवर्तली ॥4॥ ऐसी या संकटाची संधी । धांव घालावी कृपानिधी । तुका ह्मणे माझी बळबुद्धी । सकळ सिद्धी पाय तुझे ॥5॥ 632 आतां धर्माधमाअ कांहीं उचित । माझें विचारावें हित । तुज मी ठाउका पतित । शरणागत परि जालों ॥1॥ येथें राया रंका एकी सरी । नाहीं भिन्नाभिन्न तुमच्या घरीं । पावलों पाय भलत्या परी। मग बाहेरी न घालावें ॥ध्रु.॥ ऐसें हें चालत आलें मागें । नाहीं मी बोलत वाउगें । आपुलिया पडिल्या प्रसंगें । कीतिऩ हे जगे वाणिजेते ॥2॥ घालोनियां माथां बैसलों भार । सांडिला लौकिक वेव्हार । आधीं हे विचारिली थार । अविनाश पर पद ऐसें ॥3॥ येथें एक वर्म पाहिजे धीर । परि म्यां लेखिलें असार । देह हें नाशिवंत जाणार । धरिलें सार नाम तुझें ॥4॥ केली आराणुक सकळां हातीं। धरावें धरिलें तें चित्तीं । तुका ह्मणें सांगितलें संतीं। देइप अंतीं ठाव मज देवा ॥5॥ 633 बरवें झालें आलों जन्मासी । जोड जोडिली मनुष्य देहा ऐसी । महा लाभाची उत्तम रासी । जेणें सुखासी पात्र होइजे ॥1॥ दिलीं इंिद्रयें हात पाय कान । डोळे मुख बोलावया वचन । जेणें तूं जोडसी नारायण । नासे जीवपण भवरोग ॥ध्रु.॥ तिळेंतीळ पुण्य सांचा पडे । तरि हें बहुतां जन्मीं जोडे । नाम तुझें वाचेसी आतुडे । समागम घडे संतांचा ॥2॥ ऐसिये पावविलों ठायीं । आतां मी कांइऩ होऊं उतराइऩ। येवढा जीव ठेवीन पायीं । तूं माझे आइऩ पांडुरंगे ॥3॥ फेडियेला डोिळयांचा कवळ । धुतला गुणदोषांचा मळ । लावूनि स्तनीं केलों सीतळ । निजविलों बाळ निजस्थानीं ॥4॥ नाहीं या आनंदासी जोडा । सांगतां गोष्टी लागती गोडा । आला आकारा आमुच्या चाडा। तुका ह्मणे भिडा भHीचिया ॥5॥ 634 अल्प भाव अल्प मती । अल्प आयुष्य नाहीं हातीं । अपराधाची वोिळलों मूर्ती । अहो वेदमूर्ती परियेसा ॥1॥ किती दोषा देऊं परिहार । गुणदोषें मिळलें अंतर । आदि वर्तमान भविष्याकार। गेला अंतपार ऐसें नाहीं ॥ध्रु.॥ विविध कर्म चौ†याशी फेरा । त्रिविध भोग या शरीरा । कर्मकोठार पांजरा । जन्मजरामरणसांटवण ॥2॥ जीवा नाहीं कुडीचें लाहातें । यें भिन्न पंच भूतें । रचतें खचतें संचितें । असार रितें फलकट ॥3॥ पुत्र पत्नी सहोदर । मायबाप गोताचा पसर । मिळतां काष्ठें लोटतां पूर । आदळीं दूर होती खलाळीं ॥4॥ ह्मणोनि नासावें अYाान । इतुलें करीं कृपादान । कृपाळु तूं जनादऩन । धरूनि चरण तुका विनवी ॥5॥ 635 ऐसी हे गर्जवूं वैखरी । केशव मुकुंद मुरारी । राम कृष्ण नामें बरीं । हरी हरी दोष सकळ ॥1॥ जनादऩना जगजीवना। विराटस्वरूपा वामना । महदादि मधुसूदना । भवबंधना तोडितिया ॥ध्रु.॥ चक्रपाणी गदाधरा । असुरमदऩना वीर्यवीरा । सकळमुगुटमणि शूरा । अहो दातारा जगदानिया ॥2॥ मदनमूर्ती मनमोहना । गोपाळगोपिकारमणा । नटनाटएकौशल्य कान्हा । अहो संपन्ना सर्वगुणें ॥3॥ गुणवंता आणि निर्गुणा । सर्वसाक्षी आणि सर्वजाणा। करोनि अकर्ता आपणा । नेदी अभिमाना आतळों ॥4॥ कासयानें घडे याची सेवा । काय एक समर्पावें या देवा । वश्य तो नव्हे वांचुनि भावा । पाय जीवावेगळे न करी तुका ॥5॥ 636 होतों तें चिंतीत मानसीं । नवस फळले नवसीं । जोडिते नारायणा ऐसी । अविट ज्यासी नाश नाहीं ॥1॥ धरिले जीवीं न सोडीं पाय । आलें या जीवित्वाचें काय । कैं हे पाविजेती ठाय । लाविली सोय संचितानें ॥ध्रु.॥ मज तों पडियेली होती भुली। चित्ताची अपसव्य चाली । होती मृगजळें गोवी केली । दृिष्ट उघडली बरें जालें ॥2॥ आतां हा सििद्ध पावो भाव । मध्यें चांचल्यें न व्हावा जीव । ऐसी तुह्मां भाकीतसें कींव । कृपाळुवा जगदानिया ॥3॥ कळों येतें आपुले बुद्धी । ऐसें तों न घडतें कधीं। केवढे आघात ते मधीं । लज्जा रिद्धी उभी आड ठाके ॥4॥ कृपा या केली संतजनीं । माझी अळंकारिली वाणी । प्रीति हे लाविली कीर्तनीं । तुका चरणीं लोळतसे ॥5॥ 637 तुझिया पार नाहीं गुणां । माझी अल्प मति नारायणा। भवतारका जी सुजाणा । एक विYाापना पायांपाशीं ॥1॥ काय जाणावें म्यां दीनें । तुझिये भHीचीं लक्षणें । धड तें तोंड धोऊं नेणें । परि चिंतनें काळ सारीं ॥ध्रु.॥ न लवीं आणीक कांहीं पिसें। माझिया मना वांयां जाय ऐसें । चालवीं आपुल्या प्रकाशें । हातीं सरिसें धरोनियां ॥2॥ तुज समपिऩली काया । जीवें भावें पंढरीराया। सांभाळीं समविषम डाया । करीं छाया कृपेची ॥3॥ चतुर तरीं चतुरां रावो । जाणता तरीं जीवांचा जीव । न्यून तो कोण एक ठाव। आरुष भाव परि माझा ॥4॥ होतें तें माझें भांडवल । पायांपें निवेदिले बोल । आदरा ऐसें पाविजे मोल । तुका ह्मणे साच फोल तूं जाणसी ॥5॥ 638 कां हो माझा मानियेला भार । ऐसा दिसे फार । अनंत पावविलीं उद्धार । नव्हे चि थार मज शेवटीं ॥1॥ पाप बिळवंत गाढें । तुज ही राहों सकतें पुढें । मागील कांहीं राहिलें ओढें । नवल कोडें देखियेलें ॥2॥ काय मानिती संतजन । तुमचें हीनत्ववचन। कीं वृद्ध जाला नारायण । न चले पण आधील तो ॥3॥ आतां न करावी चोरी । बहुत न धरावें दुरी । पडदा काय घरच्याघरीं । धरिलें दुरी तेव्हां धरिलें ॥4॥ नको चाळवूं अनंता । कासया होतोसि नेणता । काय तूं नाहीं धरीत सत्ता । तुका ह्मणे आतां होइप प्रगट ॥5॥ 639 मज ते हांसतील संत । जींहीं देखिलेती मूतिऩमंत । ह्मणोनि उद्वेगलें चित्त । आहा च भH ऐसा दिसें ॥1॥ ध्यानीं म्या वर्णावेति कैसे । पुढें एकीं स्तुति केली असे । तेथूनि जीव निघत नसे । ऐसिये आश लागलोंसें ॥ध्रु.॥ कासया पाडिला जी धडा । उगा चि वेडा आणि वांकडा । आह्मां लेंकरांसि पीडा । एक मागें जोडा दुस†याचा ॥2॥ सांगा कोणाचा अन्याय । ऐसें मी धरीतसें पाय । तूं तंव सम चि सकळां माय । काय अन्याय एक माझा ॥3॥ नये हा जरी कारणा । तरी कां व्यालेति नारायणा । वचन द्यावें जी वचना । मज अYााना समजावीं ॥4॥ बहुत दिवस केला बोभाट । पाहातां श्रमलों ते वाट । तुका ह्मणे विस्तारलें ताट । काय वीट आला नेणों स्वामी ॥5॥ 640 बरें जालें आजिवरी । नाहीं पडिलों मृत्याचे आहारीं । वांचोन आलों एथवरी । उरलें तें हरी तुह्मां समर्पण ॥1॥ दिला या काळें अवकाश । नाहीं पावलें आयुष्य नाश । कार्या कारण उरलें शेष । गेलें तें भूस जावो परतें ॥ध्रु.॥ बुडणें खोटें पावतां थडी । स्वप्नीं जाली ओढाओढी । नासली जागृतीची घडी । साच जोडी शेवटीं गोड घास ॥2॥ तुह्मासि पावविली हाक । तेणें निरसला धाक । तुमचें भातें हें कवतुक । जे शरणागत लोक रक्षावे ॥3॥ रवीच्या नावें निशीचा नाश । उदय होतां चि प्रकाश । अतां कैचा आह्मां दोष । तूं जगदीश कैवारी ॥4॥ आतां जळो देह सुख दंभ मान । न करीं याचें साधन । तूं जगदादि नारायण । आलों शरण तुका ह्मणे ॥5॥ 641 आतां माझा नेणों परतों भाव । विसावोनि पायीं ठेविला जीव । सकळां लाभांचा हा ठाव । ऐसा वाव जाला चित्ताठायीं ॥1॥ भांडवल गांठी तरि विश्वास । जालों तों जालों निश्चय दास । न पाहें मागील ते वास । पुढती सोस सेवेचा ची ॥ध्रु.॥ आहे तें निवेदिलें सर्व । मी हें माझें मोडियला गर्व । अकाळीं काळ अवघें पर्व । जाला भरवसा कृपेलाभाचा ॥2॥ वेव्हारीं वेव्हारा अनंत । नाहीं यावांचुनी जाणत । तरी हें समाधान चित्त । लाभहानी नाहीं येत अंतरा ॥3॥ करूनि नातळों संसारा । अंग भिन्न राखिला पसारा । कळवळा तो जीवनीं खरा । बीजाचा थारा दुरी आघात ॥4॥ बहु मतापासूनि निराळा । होऊनि राहिलों सोंवळा । बैसल्या रूपाचा कळवळा । तुका ह्मणे डोळां लेइलों तें ॥5॥ 642 तुळसीमाळा घालुनी कंठीं । उभा विटेवरी जगजेठी । अवलोकोनि पुंडलीका दृष्टी । असे भीमातटीं पंढरीनाथ ॥1॥ भुिHमुिH जयाच्या कामारी । रििद्धसििद्ध वोळगती द्वारीं । सुदर्शन घरटी करी । काळ कांपे दुरी धाकें तया ॥2॥ जगज्जननी असे वाम भागीं । भीमकी शोभली अर्धांगीं । जैसी विद्युल्लता झमके मेघीं । दरुषणें भंगी महा दोष ॥3॥ सुखसागर परमानंदु । गोपीगोपाळां गोधनां छंदु । पिक्षश्वापदां जयाचा वेधु । वाहे गोविंदु पांवा छंदें ॥4॥ मुखमंडित चतुर्भुजा । मनमोहना गरुडध्वजा । तुका ह्मणे स्वामी माझा । पावे भिHकाजा लवलाहीं ॥5॥ 643 हातींचें न संडावें देवें । शरण आलों जीवें भावें । आपुलें ऐसें ह्मणावें । करितों जीवें निंबलोण ॥1॥ बैसतां संतांचे पंगती । कळों आलें कमळापती । आपुलीं कोणी च नव्हती । निश्चय चित्तीं दृढ जाला ॥ध्रु.॥ येती तुझिया भजना आड । दाविती प्रपंचाचें कोड । कनिष्ठीं रुचि ठेऊनि गोड । देखत नाड कळतसे ॥2॥ मरती मेलीं नेणों किती । तो चि लाभ तयाचे संगती । ह्मणोनि येतों काकुलती । धीर तो चित्तीं दृढ द्यावा ॥3॥ सुखें निंदोत हे जन । न करीं तयांशीं वचन । आदिपिता तूं नारायण । जोडी चरण तुमचे तें ॥4॥ आपलें आपण न करूं हित । करूं हें प्रमाण संचित । तरी मी नष्ट चि पतित । तुका ह्मणे मज संत हांसती ॥5॥ 644 बरवें जालें लागलों कारणीं । तुमचे राहिलों चरणीं । फेडीन संतसंगती धणी । गर्जइल गुणीं वैखरी ॥1॥ न वंचें शरीर सेवेसी । काया वाचा आणि मनेसीं । जालों संताची अंदणी दासी। केला याविशीं निर्धार ॥ध्रु.॥ जीवनीं राखिला जिव्हाळा । जालों मी मजसी निराळा । पंचभूतांचा पुतळा । सहज लीळा वर्ततसे ॥2॥ जयाचें जया होइऩल ठावें । लाहो या साधियेला भावें । ऐसें होतें राखियलें जीवें । येथूनि देवें भोवहुनी ॥3॥ आस निरसली ये खेपे। अवघे पंथ जाले सोपे । तुमचे दीनबंधु कृपें । दुसरें कांपे सत्ताधाकें ॥4॥ अंकिले पणें आनंदरूप । आतळों नये पुण्यपाप । सारूनि ठेविले संकल्प । तुका ह्मणे आपें आप एकाएकीं ॥5॥ 645 अवघ्या दशा येणें साधती । मुख्य उपासना सगुणभHी। प्रगटे हृदयींची मूर्ती । भावशुिद्ध जाणोनियां ॥1॥ बीज आणि फळ हरींचे नाम । सकळ पुण्य सकळ धर्म । सकळां कळांचें हे वर्म। निवारी श्रम सकळ ही ॥ध्रु.॥ जेथें कीर्तन हें नामघोष । करिती निर्लज्ज हरीचे दास । सकळ वोथंबले रस । तुटती पाश भवबंधाचे ॥2॥ येती अंगा वसती लक्षणें । अंतरीं देवें धरिलें ठाणें। आपण चि येती तयाचा गुण । जाणें येणें खुंटे वस्तीचें ॥3॥ न लगे सांडावा आश्रम । उपजले कुळींचे धर्म । आणीक न करावे श्रम । एक पुरे नाम विठोबाचें ॥4॥ वेदपुरुष नारायण । योगियांचें ब्रह्म शून्य । मुHा आत्मा परिपूर्ण । तुका ह्मणे सगुण भोऑया आह्मां ॥5॥ 646 श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा । जगव्यापका जनादऩना । आनंदघना अविनाशा ॥1॥ सकळदेवा आदिदेवा । कृपाळुवा जी केशवा । महा महानुभवा । सदाशिवा सहजरूपा ॥ध्रु.॥ चक्रधरा विश्वंभरा । गरुडध्वजा करुणाकरा । सहस्रपादा सहस्रकरा । क्षीरसागरा शेषशयना ॥2॥ कमलनयना कमलापती । कामिनीमोहना मदनमूर्ती । भवतारका धरित्या िक्षती । वामनमूर्ती त्रिविक्रमा ॥3॥ अगा ये सगुणा निर्गुणा । जगज्जनित्या जगज्जीवना। वसुदेवदेवकीनंदना । बाळरांगणा बाळकृष्णा ॥4॥ तुका आला लोटांगणी । मज ठाव द्यावा जी चरणीं । हे चि करीतसें विनवणी। भवबंधनीं सोडवावें ॥5॥ 647 आतां येणें बळें पंढरीनाथ । जवळी राहिला तिष्ठत । पाहातां न कळे जयाचा अंत । तो चि हृदयांत घालूं आतां ॥1॥ विसरोनि आपुला देहपणभाव । नामें चि भुलविला पंढरीराव । न विचारी याती कुळ नांव । लागावया पाव संतांचे ॥2॥ बरें वर्म आलें आमुचिया हातां । हिंडावें धुंडावें न लगतां । होय अविनाश सहाकारी दाता । चतुर्भुज संता परि धाकें ॥3॥ होय आवडी सानें थोर । रूप सुंदर मनोहर । भिHिप्रय लोभापर । करी आदर याचकपणें ॥4॥ तें वर्म आलें आमुच्या हाता । ह्मणोनि शरण निघालों संतां । तुका ह्मणे पंढरीनाथा । न सोडी आतां जीवें भावें ॥5॥ 648 माझा तंव खुंटला उपाव । जेणें तुझे आतुडती पाव । करूं भिH तरि नाहीं भाव । नाहीं हातीं जीव कवणेविशीं ॥1॥ धर्म करूं तरि नाहीं चित्त । दान देऊं तरि नाहीं वित्त । नेणें पुजों ब्राह्मण अतीत । नाहीं भूतदया पोटा हातीं ॥2॥ नेणें गुरुदास्य संतसेवन । जप तप अनुष्ठान । नव्हे वैराग्य वनसेवन । नव्हे दमन इंिद्रयांसी ॥3॥ तीर्थ करूं तरि मन नये सवें । व्रत करूं तरि विधि नेणें स्वभावें । देव जरि आहे ह्मणों मजसवें । तरि आपपरावें न वंचे ॥4॥ ह्मणोनि जालों शरणागत । तुझा दास मी अंकित । यास कांहीं न लगे संचित । जालों नििंश्चत तुका ह्मणे ॥5॥ 649 तरि म्यां आळवावे कोणा । कोण हे पुरवील वासना। तुजवांचूनि नारायणा । लावी स्तना कृपावंते ॥1॥ आपुला न विचारी सिण । न धरीं अंगसंगें भिन्न । अंगीकारिलें राखें दीन । देइप जीवदान आवडीचें ॥ध्रु.॥ माझिये मनासिहे आस । नित्य सेवावा ब्रह्मरस । अखंड चरणींचा वास । पुरवीं आस याचकाची ॥2॥ माझिया संचिताचा ठेवा । तेणें हे वाट दाविली देवा । एवढएा आदराचा हेवा । मागें सेवादान आवडीनें ॥3॥ आळवीन करुणावचनीं। आणीक गोड न लगे मनीं । निद्रा जागृती आणि स्वप्नीं । धरिलें ध्यानीं मनीं रूप ॥4॥ आतां भेट न भेटतां आहे । किंवा नाहीं ऐसें विचारूनि पाहें । लागला झरा अखंड आहे । तुका ह्मणे साहे केलें अंतरीं ॥5॥ 650 हें चि भवरोगाचें औषध । जन्म जरा तुटे व्याध । आणीक कांहीं नव्हे बाध । करील वध षड्वर्गा ॥1॥ सांवळें रूप ल्यावें डोळां । सा चौ अठरांचा गोळा । पदर लागों नेदी खळा । नाममंत्रमाळा विष्णुसहस्र ॥ध्रु.॥ भोजना न द्यावें अन्न । जेणें चुके अनुपान । तरीं च घेतल्याचा गुण । होइऩल जाण सत्य भाव ॥2॥ नये निघों आपुलिया घरा । बाहेर लागों नये वारा । बहु बोलणें तें सारा । संग दुसरा वर्जावा ॥3॥ पास तें एक द्यावें वरी । नवनीताची होइऩल परी । होइऩल गुसिळलें तें निवारी । सार भीतरी नाहीं तया ॥4॥ न्हायें अनुतापीं पांघरें दिशा । स्वेद निघों दे अवघी आशा । होसिल मागें होतासि तैसा । तुका ह्मणे दशा भोगीं वैराग्य ॥5॥ 651 मागुता हा चि जन्म पावसी । भोगिलें सुखदुःख जाणसी। हें तों न घडे रे सायासीं । कां रे अंध होसी जाणोनियां ॥1॥ लक्ष चौ†याशी न चुके फेरा । गर्भवासीं यातना थोरा । येउनि पडसी संदेहपुरा। वोळसा थोरा मायाजाळीं ॥2॥ पशु काय पापपुण्य जाणती । उत्तम मध्यम भोग भोगिती । कांहीं एक उपजतां मरती । बहिरीं अंध होती पांगुळ मुकीं ॥3॥ नरदेह निधान लागलें हातीं । उत्तम सार उत्तम गती । होइन देव चि ह्मणती ते होती । तरि कां चित्तीं न धरावें ॥4॥ क्षण एक मन िस्थर करूनी । साव होइप डोळे उघडोनी । पाहें वेद बोलिले पुराणीं । तुका विनवणी करीतसे ॥5॥ 652 दास्य करी दासांचें । उणें न साहे तयांचें । वाढिलें ठायींचें । भानें टाकोनियां धांवे ॥1॥ ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटीं कर । सर्वस्वें उदार । भHांलागीं प्रगटे ॥ध्रु.॥ हृदयीं श्रीवत्सलांछन । मिरवी भHांचें भूषण । नाहीं तयाचा सीण । सुख धरिलें लातेचें ॥2॥ सत्यभामा दान करी । उजुर नाहीं अंगीकारी । सेवकाच्या शिरीं । धरूनि चाले पादुका ॥3॥ राखे दारवंटा बळीचा। रथी जाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥4॥ भिडा नो बोलवें पुंडलिकाशीं । उभा मर्यादा पाठीशीं । तुका ह्मणे ऐसी । कां रे न भजा माउली ॥5॥ 653 हरि तैसे हरीचे दास । नाहीं तयां भय मोह चिंता आस। होउनि राहाती उदास । बळकट कांस भHीची ॥1॥ धरूनि पाय तजिलें जन । न लगे मान मृित्तकाधन । कंठीं नाम अमृताचें पान। न लगे आन ऐसें जालें ॥ध्रु.॥ वाव तरी उदंड च पोटीं । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । वेठी तरी गि†हे राबवीती ॥2॥ बळें तरि नांगवती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥3॥ संसार तो तयांचा दास । मोक्ष तें पाहातसे वास । रििद्धसििद्ध देशटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥4॥ जन्ममृत्युस्वप्नांसारिखें । आप त्यां न दिसे पारखें । तुका ह्मणे अखंडित सुखें । वाणी वदे मुखें प्रेमा अमृताची ॥5॥ 654 बहुत जाचलों संसारीं । वसें गभाअ मातेच्या उदरीं । लक्ष चौ†याशी योनिद्वारीं । जालों भिकारी याचक ॥1॥ जिणें पराधीन आणिकां हातीं । दृढ पाशीं बांधलों संचितीं । प्रारब्ध क्रियमाण सांगाती । भोवंडिती सत्ता आपुलिया ॥ध्रु.॥ न भरे पोट नाहीं विसांवा । नाहीं नेम एक ठाव गांवा । नाहीं सत्ता न फिरे ऐसी देवा । लाहे जीवा खापरीं तडफडी ॥2॥ काळ बहुत गेले ऐसिया रीती । आणीक पुढें नेणों किती । खंडणा नाहीं पुनरावृत्ती । मज कल्पांतीं तरी वेगळें ॥3॥ ऐसें दुःख कोण हरील माझें । कोणा भार घालूं आपुलें ओझें । भवसिंधुतारक नाम तुझें । धांवसि काजें आडलिया ॥4॥ आतां धांव घालीं नारायणा । मजकारणें रंका दीना । गुण न विचारीं अवगुणा । तुका करुणा भाकीतसे ॥5॥ 655 जंव हें सकळ सिद्ध आहे । हात चालावया पाये । तंव तूं आपुलें स्वहित पाहें । तीर्थयात्रे जायें चुकों नको ॥1॥ जंव काळ असे दुरी ठेला । तंव तूं हरिगुण गायें आइक वहिला । मनीं भाव धरूनि भला । न वंचें त्याला चुकों नको ॥2॥ जोडोनि धन न घलीं माती । ब्रह्मवृंदें पूजन इति । सत्य आचरण दया भूतीं । करीं सांगाती चुकों नको ॥3॥ दशा यौवन बाणली अंगीं । पांगिला नव्हें विषयसंगीं । काम क्रोध लोभ मोह त्यागीं । राहें संतसंगीं चुकों नको ॥5॥ मग तेथें न चले कांहीं । सत्ता संपदा राहेल ठायींच्या ठायीं। पुढें संचित जाइऩल ग्वाही । तुका ह्मणे ते ही यमआYाा ॥5॥ 656 ऐक पांडुरंगा एक मात । कांहीं बोलणें आहे एकांत । आह्मां जरी तारील संचित । तरी उचित काय तुझें ॥1॥ उसनें फेडितां धर्म तो कोण । काय तया मानवेल जन । काय गा मिरवूनि भूषण । वांयां थोरपण जनांमध्यें ॥ध्रु.॥ अन्न जरी न मिळे तयासी देणें । आगांतुक पात्र उचित दान । उपकार तरी धनमंत्रीपणें । जरी देणेंघेणें नाहीं आशा ॥2॥ शूर तों तयासी बोलिजे जाणा । पाठीशीं घालूनि राखे दीना । पार पुण्य नाहीं त्या भूषणा । ऐक नारायणा वचन हें ॥3॥ आतां पुढें बोलणें तें काइप । मज तारिसी तरी च सही । वचन आपुलें सिद्धी नेइप । तुका ह्मणे तइप मज कळसी ॥4॥ 657 चांगलें नाम गोमटें रूप । निवती डोळे हरती ताप । विठ्ठल विठ्ठल हा जप । प्रगट स्वल्प । अति सार ॥1॥ शस्त्र हे निर्वाणींचा बाण । निकट समय अवसान । कोठें योजेल दश दान। खंडी नारायण दुःख चिंतनें ॥ध्रु.॥ सकळ श्रेष्ठांचें मत । पावे सिद्धी पाववी अनंत । ह्मणोनि व्हावें शरणागत । आहे उचित एवढें चि ॥2॥ ह्मणोनि रुसलों संसारा । सर्प विखार हा पांढरा । तुजशीं अंतर रे दातारा । या चि दावेदारानिमित्त ॥3॥ येणें मज भोगविल्या खाणी। नसतां छंद लाविला मनीं । माजलों मी माझे भ्रमणीं । जाली बोडणी विटंबना ॥4॥ पावलों केलियाचा दंड । खाणी भोगिविल्या उदंड। आतां केला पाहिजे खंड । तुका दंडवत घाली देवा ॥5॥ 658 चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥1॥ उदार तरी लIमीयेसी । जुंझार तरी किळकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥ जुनाट तरी बहु काळा । न कळे जयाची लीळा । नेणता गोवळीं गोवळा । लाघवी अवळाभुलवणा ॥2॥ गांढएा तरी भावाचा अंकित । बराडी तरी उिच्छष्टाची प्रीत । ओंगळ तरी कुब्जेशीं रत । भ्याड अनंत बहु पापा ॥3॥ खेळतो येणें चि खेळावा । नट तो येणें चि आवगावा। लपोनि जीवीं न कळे जीवा । धरितां देवा नातुडेसी ॥4॥ उंच तरी बहुत चि उंच । नीच तरी बहुत चि नीच । तुका ह्मणे बोलिलों साच। नाहीं अहाच पूजा केली ॥5॥ 659 काय आह्मी भिH करणें कैसी । काय एक वाहावें तुह्मांसी । अवघा भरोनि उरलासी । वाणीं खाणीं रसीं रूपगंधी ॥1॥ कसें करूं इंिद्रयां बंधन । पुण्यपापाचें खंडण । काय व्रत करूं आचरण । काय तुजविण उरलें तें ॥2॥ काय डोळे झांकुनियां पाहूं । मंत्रजप काय ध्याऊं । कवणें ठायीं धरूनि भाव । काय तें वाव तुजविण ॥3॥ काय हिंडों कवण दिशा । कवणे ठायीं पाय ठेवूं कैसा । काय तूं नव्हेसि न कळे तैसा । काय मी कैसा पाहों आतां ॥4॥ तुझिया नामाची सकळ । पूजा अर्चन मंत्र माळ । धूप दीप नैवेद्य फळ तांबूल । घेऊं पुष्पांजुळ तुका ह्मणे ॥5॥ 660 शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥1॥ शरीर उत्तम चांगलें। शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रह्म ॥ध्रु.॥ शरीर विटाळाचें अळें । मायामोहपाशजाळें। पतन शरीराच्या मुळें । शरीर काळें व्यापिलें ॥2॥ शरीर सकळ हें शुद्ध । शरीर निधींचा ही निध । शरीरें तुटे भवबंध । वसे मध्यें भोगी देव शरीरा ॥3॥ शरीर अविद्येचा बांधा । शरीर अवगुणाचा रांधा । शरीरीं वसे बहुत बाधा । नाहीं गुण सुदा एक शरीरीं ॥4॥ शरीरा दुःख नेदावा भोग । न द्यावें सुख न करीं त्याग । नव्हे वोखटें ना चांग । तुका ह्मणे वेग करीं हरिभजनीं ॥5॥ 661 इतुलें करीं भलत्या परी । परद्रव्य परनारी । सांडुनि अभिलाष अंतरीं । वर्तें वेव्हारीं सुखरूप ॥1॥ न करीं दंभाचा सायास । शांती राहें बहुवस । जिव्हे सेवीं सुगंधरस । न करीं आळस रामनामीं ॥2॥ जनमित्र होइप सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा । संग न धरावा दुर्जनाचा । करीं संतांचा सायास ॥3॥ करिसी देवाविण आस । अवघी होइऩल निरास । तृष्णा वाढविसी बहुवस । कधीं सुखास न पवसी ॥4॥ धरूनि विश्वास करीं धीर । करितां देव हा चि निर्धार । तयाचा वाहे योगक्षेमभार । नाहीं अंतर तुका ह्मणे ॥5॥ 662 संसारसिंधु हा दुस्तर । नुलंघवे उलंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥1॥ किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवताअ भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥ वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥2॥ अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥3॥ ऐसीं उलंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥4॥ सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका ह्मणे भ्रष्ट जालों देवद्रोही ॥5॥ 663 विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥1॥ विठ्ठल स्मरणा कोंवळा। विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रह्मांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥ उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥2॥ रुचीचे प्रकार। आणिताती आदरें । कोठें ही न पडे अंतर । थोरां थोर धाकुटएा धाकुटा ॥3॥ करितां बळ धरितां नये । झोंबतां डोळे मनें च होय। आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥4॥ पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका ह्मणे चित्तें चित्त मेळवूनी ॥5॥ 664 ताप हें हरण श्रीमुख । हरी भवरोगा ऐसें दुःख । अवलोकितां उपजे सुख । उभें सन्मुख दृष्टीपुढें ॥1॥ न पुरे डोिळयांची धणी । सखोल कृपेची च खाणी । स्तवितां न पुरे वेदवाणी । तो हा समचरणी कृपानिधी ॥ध्रु.॥ रामकृष्णध्यान वामननारसिंहीं । उग्र आणि सौम्य कांहीं च नाहीं । सांपडे भरलीये वाही । भाव शुद्ध पाहीं याचें भातुकें ॥2॥ गुणगंभीर चतुर सुजाण। शूर धीर उदार नारायण। व्यापक तरी त्रिभुवन । मनमोहनलावण्य हें ॥3॥ ठाण हें साजिरें सुंदर । अविनाश अविकार । अनंत आणि अपार । तो हा कटीं कर धरिताहे ॥4॥ जयाची वाणी सुमनमाळा। परमामृतजिव्हाळा । अनंता अंगीं अनंत कळा । तुका जवळा चरण सेवे ॥5॥ कान्होबा0नाट अभंग 7 665 अगा ये वैकुंटनायका । अगा ये त्रैलोक्यतारका । अगा जनादऩना जगव्यापका । अगा पाळका भHांचिया ॥1॥ अगा ये वसुदेवदेवकीनंदना । अगा ये गोपिकारमणा । अगा बिळबंध वामना। अगा निधाना गुणनिधी ॥ध्रु.॥ अगा ये द्रौपदीबांधवा । अगा ये सखया पांडवा । अगा जीवाचिये जीवा । अगा माधवा मधुसूदना ॥2॥ अगा महेश्वरा महाराजा । अगा श्रीहरी गरुडध्वजा । अगा सुंदरा सहस्रभुजा । पार मी तुझा काय वणूप ॥3॥ अगा अंबॠषिपरंपरा। निलारंभ निविऩकारा । अगा गोवर्धन धरणीधरा । अगा माहेरा दीनाचिया ॥4॥ अगा धर्मराया धर्मशीळा । कृपासिंधु कृपाळा । अगा प्रेमाचिया कल्लोळा । सकळकळाप्रवीणा ॥5॥ अगा चतुरा सुजाणा । मधुरागिरा सुलक्षणा । अगा उदारा असुरमदऩना । राखें शरणा तुकयाबंधु ॥6॥ 666 उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥1॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥2॥ श्रवणीं कुंडलें देती ढाळ । दशांगुळीं मुिद्रका माळ । दंतओळी हिरे झळाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥3॥ कडीं कडदोरा वांकी वेळा । बाहीं बाहुवटे पदक गळां । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळां विद्युल्लता ॥4॥ सुंदरपणाची साम्यता । काय वणूप ते पावे आतां । तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । धन्य ते मातापिता प्रसवली ॥5॥ 667 एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥1॥ नको दुजी बुिद्ध आणीक । रििद्धसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥ मना येइऩल तो जन्म देइप । भलते कुळीं भलते ठायीं । तें मी सांकडें घालीत नाहीं । हृदयींहुनीं तूं न वजें ॥2॥ इतुलें करीं भलत्या परी । भलत्या भावें तुझें द्वारीं । राहेन दास होऊनि कामारी । वदो वैखरी नित्य नाम ॥3॥ नको विचारूं दुसरें आतां । शरण आलों जी पंढरीनाथा । तुकयाबंधु ह्मणे रे अच्युता । आहेसि तूं दाता दानशूर ॥4॥ 668 कइप देखतां होइऩन डोळीं । सकळां भूतीं मूतिऩ सांवळी। जीवा नांव भूमंडळीं । जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं ॥1॥ ऐसा कृपा करील नारायण । जीव जगाचा होइऩन । प्रेमसागरीं बुडइऩन । होइऩल स्नान अनुतापीं ॥ध्रु.॥ ऐसा कइप येइऩन दैवास । दृश्य नासोनि जाइऩल आस । सदा संतचरणीं देहाचा वास । सेवीन शेष धणीवरी ॥2॥ कइप नवसा येतील अंकुर । सुखा नाहींसा होइऩल पार । अमृत तें पृथ्वीजळ सागर । वाहाती पूर आनंदाचे ॥3॥ प्रसन्न दया क्षमा शांति । कइप नवविधा होइऩल भिH । भोगीन वैराग्यसंपित्त । मनोरथ कळती तइप पुरले ॥4॥ तुकयाबंधु ह्मणे सांग । नव्हे तुजविण निरसेना पांग । ह्मणोनि घातलें साष्टांग । पांडुरंगा वरी चरणा ॥5॥ 669 तूं बिळया शिरोमणी । आहेसि माजी ये त्रिभुवनीं । रिघालों पाठी तुझी ह्मणउनी । आतां करीन मी असेल तें ॥1॥ तूं देवा प्रतापदिनकर । सुरा असुरांचा सुर । महावीरां वीर धनुर्धर । मी तों पामर काय तेथें ॥ध्रु.॥ कृपासिंधु दीनवत्सल । फोडिली देवाची बंदशाळ । संहारूनि राक्षसदळ । शरणागत राजीं स्थापिला ॥2॥ उपकर्म करावा बहुत । तरी तूं जाणसी धर्मनीत । उचित काय तें अनुचित । राखें शरणागत आलों आतां ॥3॥ किती म्यां काय विनवावें । शरण आलों जीवें भावें । तुकयाबंधु ह्मणे करावें । क्षेम अवघें येणें काळें ॥4॥ 670 देवा मी चांडाळ चांडाळ । ह्मणतां लागताहे वेळ । नसे पाहातां भूमंडळ । ऐसा अमंगळ खळ दुसरा ॥1॥ जन्मा उपजलियापासुनी । असत्य कर्म तें अझुनी । सत्य आचरण नेणें स्वप्नीं । निखळ खाणी अवगुणांची ॥2॥ भिH दया अथवा कथा। कानीं न साहवे वार्ता । अखंड विषयांची वेथा । अधम पुरता अधमाहुनी ॥3॥ काम क्रोध दंभ अहंकार । गर्व ताठा मद मत्सर । यांचें तरी माहेरघर । परउपकार वैरी तैसा ॥4॥ निंदा द्वेष घात विश्वास । करितां नाहीं केला आळस । करूं नये ते केले संतउपहास । अभक्ष तें ही भिक्षलें ॥5॥ पािळलें नाहीं पितृवचन। सदा परद्वारीं परधनीं ध्यान । बोलों नये घडलें ऐसें अनोविन । दासीगमन आदिकरूनी ॥6॥ कायामनें वाचाइंिद्रयांशीं । सकळ पापांची च राशी । तुकयाबंधु ह्मणे ऐसियासी । आलों हृषीकेशी तुज शरण ॥7॥ 671 काय काय करितों या मना । परी नाइके नारायणा । करूं नये त्याची करी विवंचना । पतना नेऊं आदरिलें ॥1॥ भलतिये सवें धांवे सैराट । वाट आडवाट दरे दरकुट । न विचारी कुडें कांहीं कपट । घात बळकट मांडियेला ॥2॥ न पुरती भ्रमणा दाही दिशा । सप्त ही पाताळ आकाशा । घाली उडी बळें चि देखोनि फांसा । केलों या देशा पाहुणा ॥3॥ चेतवूनि इंिद्रयें सकळ। आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ । दुराविली शुद्ध बुिद्ध केली राळ । ऐसें चांडाळ अनिवार हें ॥4॥ आतां काय ऐसें करावें यासी । बहु जाचिलों केलों कासाविसी । तुकयाबंधु ह्मणे हृषीकेशी । धांव मज ऐसी परी जाली ॥5॥ नाटाचे अभंग समाप्त 63 ------------------------ 672 काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥1॥ कोपला पाटील गांवचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥ आतां येणें चवी सांडिली ह्मणती । निवाडा करिती दिवाणांत ॥2॥ भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥3॥ तुका ह्मणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥4॥ 673 संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥1॥ संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥ संतासी देखोनि करितो ढवाऑया । भावें धुतो चोऑया दासीचिया ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥3॥ 674 एक प्रेमगुज ऐकें जगजेठी । आठवली गोष्टी सांगतसें ॥1॥ एक मृग दोन्ही पाडसांसहित । आनंदें चरत होती वनी ॥ध्रु.॥ अवचिता तेथें पारधी पावला । घेऊनियां आला श्वानें दोन्ही ॥2॥ एकीकडे त्याणें चिरिल्या वाघुरा । ठेविलें श्वानपुत्रा एकीकडे ॥3॥ एकीकडे तेणें वोणवा लाविला । आपण राहिला एकीकडे ॥4॥ चहूंकडोनियां मृगें वेढियेलीं । स्मरों तें लागलीं नाम तुझें ॥5॥ रामा कृष्णा हरी गोविंदा केशवा । देवाचिया देवा पावें आतां ॥6॥ कोण रक्षी आतां ऐसिये संकटीं । बापा जगजेठी तुजविण ॥7॥ आइकोनि तुह्मी तयांचीं वचनें । कृपाअंतःकरणें कळविळलां ॥8॥ आYाा तये काळीं केली पर्जन्यासी । वेगीं पावकासी विझवावें ॥9॥ ससें एक तेथें उठवुनी पळविलें । तया पाठीं गेली श्वानें दोन्ही ॥10॥ मृगें चमकोनी सत्वर चाललीं । गोविंदें रिक्षलीं ह्मणोनियां ॥11॥ ऐसा तूं कृपाळु दयाळु आहेसी । आपुल्या भHांसी जीवलग ॥12॥ ऐसी तुझी कीर्ती जीवीं आवडती । रखुमाइऩच्या पती तुका ह्मणे ॥13॥ 675 आशाबद्ध वHा । धाक श्रोतयाच्या चित्ता ॥1॥ वांयां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥ध्रु.॥ बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥2॥ माप तैसी गोणी । तुका ह्मणे रितीं दोन्ही ॥3॥ 676 विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव या जगाचा ॥1॥ विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥2॥ विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥3॥ विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥4॥ विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥5॥ 677 बाहिर पडिलों आपुल्या कर्तव्यें । संसारासि जीवें वेटािळलों ॥1॥ एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निवडीलें ॥ध्रु.॥ जालीं दोनी नामें एका चि मथनीं । दुसरिया गुणीं वेगळालीं ॥2॥ तुका ह्मणे दाखविल्या मुHाफळीं । शिंपले चि स्वस्थळीं खुंटलिया ॥3॥ 678 बरवा बरवा बरवा रे देवा तूं । जीवाहूनी आवडसी जीवा रे देवा तूं ॥1॥ पाहातां वदन संतुष्ट लोचन । जाले आइकतां गुण श्रवण रे देवा ॥ध्रु.॥ अष्टै अंगें तनु त्रिविध ताप गेला सीण । वणिऩतां लक्षण रे देवा ॥2॥ मन जालें उन्मन अनुपम ग्रहण । तुकयाबंधु ह्मणे महिमा नेणें रे ॥3॥ 679 सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें हें अंगणीं वैष्णवांच्या ॥1॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥ भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥2॥ नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥3॥ तुका ह्मणे मोक्ष भHाचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥4॥ 680 तीथॉ केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥1॥ जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥ योग याग अनंत केले । नाहीं समचरण देखिले ॥2॥ तुका ह्मणे विठ्ठलपायीं। अनंत तीथॉ घडिलीं पाहीं ॥3॥ 681 कोणतें कारण राहिलें यामुळें । जें म्यां तुज बळें कष्टवावें ॥1॥ नाहीं जात जीव नाहीं होत हानी । सहज तें मनीं आठवलें ॥ध्रु.॥ नाहीं कांहीं चिंता मरतों उपवासी । अथवा त्या ह्मैसी गाइऩ व्हाव्या ॥2॥ हें तों तुज कळों येतसे अंतरीं । लाखणीक वरी साच भाव ॥3॥ तुका ह्मणे देवा नासिवंतासाठीं । पायांसवें तुटी करिती तुझ्या ॥4॥ 682 रामा अयोध्येच्या राया । दिनानाथा रे सखया ॥1॥ पाप ताप विघ्न हरीं । दिनानाथा सुख करीं ॥ध्रु.॥ भिलटीचिया रे उिच्छष्टा । स्वीकारिसी रे तूं भ्रष्टा ॥2॥ मी तों सलगीचें मूल । तुका ह्मणे तू सखोल ॥3॥ 683 तुजवरी ज्याचें मन । दरुषण दे त्याचें ॥1॥ कैसा जाती शुद्ध भाव । हात पाव ना वृत्ती ॥ध्रु.॥ अवघियांचा करूनि मेळा । तुज डोळां रोखिलें ॥2॥ तुका ह्मणे तुज आड । लपोनि कोड दावीं देवा ॥3॥ 684 विश्वव्यापी माया । तिणें झाकुिळलें छाया ॥1॥ सत्य गेलें भोऑयावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥ आपुलें चि मन । करवी आपणां बंधन ॥2॥ तुका ह्मणे देवा । तुह्मी कोडीं हीं उगवा ॥3॥ 685 पोटीं जन्मती रोग । तरि कां ह्मणावे आप्तवर्ग ॥1॥ रानीं वसती औषधी । तरि कां ह्मणाव्या निपराधी ॥2॥ तैसें शरीराचें नातें । तुका ह्मणे सर्व आप्तें ॥3॥ 686 नव्हे शब्द एक देशी । सांडी गवशी कोणाला ॥1॥ जाली माझी वैखरी । विश्वंभरी व्यापक ॥ध्रु.॥ मोकलिलें जावें बाणें। भाता जेणे वाइलें ॥2॥ आतां येथें कैचा तुका । बोले सिका स्वामीचा ॥3॥ 687 गायनाचे रंगीं । शिH अद्भुत हे अंगीं ॥1॥ हें तों देणें तुमचें देवा । घ्यावी अखंडित सेवा ॥ध्रु.॥ अंगीं प्रेमाचें भरतें । नाहीं उतार चढतें ॥2॥ तुका ह्मणे वाणी । नाम अमृताची खाणी ॥3॥ 688 माप ह्मणे मी मवितें । भरी धणी ठेवी रितें ॥1॥ देवा अभिमान नको । माझेठायीं देऊं सकों ॥ध्रु.॥ देशी चाले सिका । रितें कोण लेखी रंका ॥2॥ हातीं सूत्रदोरी । तुका ह्मणे त्याची थोरी ॥3॥ 689 कोण सांगायास । गेलें होतें देशोदेश ॥1॥ नेलें वा†या हातीं माप । समर्थ तो माझा बाप ॥ध्रु.॥ कोणाची हे सत्ता। जाली वाचा वदविता ॥2॥ तुका ह्मणे या निश्चयें । माझें निरसलें भय ॥3॥ 690 सकिळकांच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ अहो श्रोते वHे सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥ फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥2॥ तुका ह्मणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥3॥ 691 कोण त्याचा पार पावला धुंडितां । पुढें विचारितां विश्वंभरा ॥1॥ अणुरेणु सूIमस्थूळा पार नाहीं । श्रुती नेती त्या ही खुंटलिया ॥ध्रु.॥ फळांत कीटक येवढें आकाश । ऐसीं तरुवरास अनेक किती ॥2॥ दाविलें अनंतें अर्जुनासि पोटीं । आणीक त्या सृिष्ट कृष्णलोक ॥3॥ तुका ह्मणे लागा संतांचिये कासे । ठाव घेतां कैसे वांचा जीवें ॥4॥ 692 जें जें कांही करितों देवा । तें तें सेवा समर्पें ॥1॥ भेद नाहीं सर्वात्मना । नारायणा तुज मज ॥ध्रु.॥ आह्मी दुजें नेणों कोणा। हें चि मना मन साक्ष ॥2॥ तुका ह्मणे जगन्नाथा । हें अन्यथा नव्हे कीं ॥3॥ 693 स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥1॥ परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥ रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रह्मांडें हीं ॥2॥ तुका ह्मणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥3॥ 694 तुज वर्णी ऐसा तुज विण नाहीं । दुजा कोणी तीहीं त्रिभुवनीं ॥1॥ सहस्रमुखें शेष सिणला बापुडा । चिरलिया धडा जिव्हा त्याच्या ॥ध्रु.॥ अव्यHा अलक्षा अपारा अनंता । निर्गुणा सचिद नारायणा ॥2॥ रूप नाम घेसी आपुल्या स्वइच्छा । होसी भाव तैसा त्याकारणें ॥3॥ तुका ह्मणे जरी दाविसी आपणा । तरि च नारायणा कळों येसी ॥4॥ 695 पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥1॥ बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाइऩ नो ॥ध्रु.॥ हें तों नाहीं सर्वकाळ । अमुप अमृतांचें जळ ॥2॥ तुका ह्मणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥3॥ 696 आणीक दुसरें मज नाहीं आतां । नेमिलें या चित्तापासुनियां ॥1॥ पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं । जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥ध्रु.॥ पडिलें वळण इंिद्रयां सकळां । भाव तो निराळा नाहीं दुजा ॥2॥ तुका ह्मणे नेत्रीं केलें ओळखण । साजिरें तें ध्यान विटेवरी ॥3॥ 697 मी तों सर्वभावें अनधिकारी । होइल कैसी परी नेणों देवा ॥1॥ पुराणींचे अर्थ आणितां मनास । होय कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥ इंिद्रयांचीं आह्मी पांगिलों अंकितें । त्यांचे रंगीं चित्त रंगलेंसे ॥2॥ एकाचें ही मज न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥3॥ तुका ह्मणे मज तारीं पंढरीराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥4॥ 698 लक्षूनियां योगी पाहाती आभास । तें दिसे आह्मांस दृष्टीपुढें ॥1॥ कर दोनी कटी राहिलासे उभा । सांवळी हे प्रभा अंगकांती ॥ध्रु.॥ व्यापूनि वेगळें राहिलेंसे दुरी । सकळां अंतरीं निविऩकार ॥2॥ रूप नाहीं रेखा नाम ही जयासी । आपुला मानसीं शिव ध्याय ॥3॥ अंत नाहीं पार वर्णा नाहीं थार । कुळ याति शिर हस्त पाद ॥4॥ अचेत चेतलें भHाचिया सुखें । आपुल्या कौतुकें तुका ह्मणे ॥5॥ 699 कैसें करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावीं मज याचकासी ॥1॥ कैसी भिH करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी ॥ध्रु.॥ कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवण कैसा तुज ॥2॥ कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्तीं । कैसी िस्थती मती दावीं मज ॥3॥ तुका ह्मणे जैसें दास केलें देवा। तैसें हें अनुभवा आणीं मज ॥4॥ 700 निगमाचें वन । नका शोधूं करूं सीण ॥1॥ या रे गौिळयांचे घरीं । बांधलें तें दावें वरी ॥ध्रु.॥ पीडलेती भ्रमें । वाट न कळतां वर्में ॥2॥ तुका ह्मणे भार । माथा टाका अहंकार ॥3॥ 701 मन वोळी मना । बुिद्ध बुद्धी क्षण क्षणां ॥1॥ मी च मज राखण जालों । ज्याणें तेथें चि धरिलों ॥ध्रु.॥ जें जें जेथें उठी। तें तें तया हातें कुंटी ॥2॥ भांजिली खांजनी । तुका साक्ष उरला दोन्ही ॥3॥ 702 ब्रह्म न लिंपे त्या मेळें । कर्माअकर्मा वेगळें ॥1॥ तो चि एक तया जाणे । पावे अनुभविलें खुणें ॥ध्रु.॥ शोच अशौचाचे संधी । तन आळा तना चि मधीं ॥2॥ पापपुण्यां नाहीं ठाव । तुका ह्मणे सहज भाव ॥3॥ 703 काय दरा करील वन । समाधान नाहीं जंव ॥1॥ तरी काय तेथें असती थोडीं । काय जोडी तयांसी ॥ध्रु.॥ रिगतां धांवा पेंवामध्यें । जोडे सििद्ध ते ठायीं ॥2॥ काय भस्म करील राख । अंतर पाख नाहीं तों ॥3॥ वर्णाआश्रमाचे धर्म । जाती श्रम जालिया ॥4॥ तुका ह्मणे सोंग पाश । निरसे आस तें हित ॥5॥ 704 तें हीं नव्हे जें करितां कांहीं । ध्यातां ध्यायीं तें ही नव्हे ॥1॥ तें ही नव्हे जें जाणवी जना । वाटे मना तें नव्हे ॥ध्रु.॥ त्रास मानिजे कांटाळा । अशुभ वाचाळा तें ही नव्हे ॥2॥ तें ही नव्हे जें भोंवतें भोंवे । नागवें धांवे तें ही नव्हे ॥3॥ तुका ह्मणे एक चि आहे । सहजिं पाहें सहज ॥4॥ 705 बोल बोलतां वाटे सोपें । करणी करितां टीर कांपे ॥1॥ नव्हे वैराग्य सोपारें । मज बोलतां न वटे खरें ॥ध्रु.॥ विष खावें ग्रासोग्रासीं । धन्य तो चि एक सोसी ॥2॥ तुका ह्मणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं ॥3॥ 706 होइऩन भिकारी । पंढरीचा वारकरी ॥1॥ हा चि माझा नेम धर्म । अवघें विठोबाचें नाम ॥ध्रु.॥ हे चि माझी उपासना । लागन संतांच्या चरणा ॥2॥ तुका ह्मणे देवा । करीन ते भोळी सेवा ॥3॥ 707 सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥1॥ त्यांची सरली वेरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥ हरी आला हाता । मग कैंची भय चिंता । तुका ह्मणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥3॥ 708 मोक्ष तुमचा देवा । तुह्मी दुर्लभ तो ठेवा ॥1॥ मज भHीची आवडी । नाहीं अंतरीं ते गोडी ॥ध्रु.॥ आपल्या प्रकारा । करा जतन दातारा ॥2॥ तुका ह्मणे भेटी । पुरे एक चि शेवटीं ॥3॥ 709 नामपाठ मुHाफळांच्या ओवणी । हें सुख सगुणीं अभिनव ॥1॥ तरी आह्मी जालों उदास निर्गुणा । भHांचिया मना मोक्ष नये ॥ध्रु.॥ द्यावें घ्यावें ऐसें येथें उरे भाव । काय ठाया ठाव पुसोनियां ॥2॥ तुका ह्मणे आतां अभयदान करा । ह्मणा विश्वंभरा दिलें ऐसें ॥3॥ 710 भवसिंधूचें काय कोडें । दावी वाट चाले पुढें ॥1॥ तारूं भला पांडुरंग । पाय भिजों नेदी अंग ॥ध्रु.॥ मागें उतरिलें बहुत । पैल तिरीं साधुसंत ॥2॥ तुका ह्मणे लाग वेगें । जाऊं तयाचिया मागें ॥3॥ 711 नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ॥1॥ असें तुमचा रजरेण । संतां पायींची वाहाण ॥ध्रु.॥ नाहीं स्वरूपीं ओळखी । भिHभाव करीं देखीं ॥2॥ नाहीं शून्याकारीं । क्षर ओळखी अक्षरीं ॥3॥ नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काइऩ ॥4॥ कांहीं नव्हें तुका । पांयां पडने हें ऐका ॥5॥ 712 सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥1॥ जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीतिऩ जेणें ॥ध्रु.॥ भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥2॥ तुका ह्मणे भोळा । जिंकुं जाणे किळकाळा ॥3॥ 713 सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥1॥ आह्मी तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥ आला भोग अंगा। न लवूं उसीर त्या त्यागा ॥2॥ तुका ह्मणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥3॥ 714 करावें चिंतन । तें चि बरें न भेटून ॥1॥ बरवा अंगीं राहे भाव । तो गे तो चि जाणा देव ॥ध्रु.॥ दर्शणाची उरी । अवस्था चि अंग धरी ॥2॥ तुका ह्मणे मन । तेथें सकळ कारण ॥3॥ 715 जें जें जेथें पावे । तें तें समर्पावें सेवे ॥1॥ सहज पूजा या चि नांवें । गिळत अभिमानें व्हावें ॥ध्रु.॥ अवघें भोगितां गोसावी। आदीं आवसानीं जीवी ॥2॥ तुका ह्मणे सिण । न धरितां नव्हे भिन्न ॥3॥ 716 नसे तरी मनो नसो । परी वाचे तरी वसो ॥1॥ देह पडो या चिंतनें । विठ्ठलनामसंकीर्तनें ॥ध्रु.॥ दंभिस्थती भलत्या भावें । मज हरिजन ह्मणावें ॥2॥ तुका ह्मणे काळें तरी । मज सांभाळील हरी ॥3॥ 717 नये जरी कांहीं । तरी भलतें चि वाहीं ॥1॥ ह्मणविल्या ढास । कोण न धरी वेठीस ॥ध्रु.॥ समर्थाच्या नांवें । भलतैसें विकावें ॥2॥ तुका ह्मणे सत्ता । वरी असते बहुतां ॥3॥ 718 न संडवे अन्न । मज न सेववे वन ॥1॥ ह्मणउनी नारायणा । कींव भाकितों करुणा ॥ध्रु.॥ नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर ॥2॥ तुका ह्मणे थोडें । आयुष्य अवघें चि कोडें ॥3॥ 719 एकांचीं उत्तरें । गोड अमृत मधुरें ॥1॥ ऐशा देवाच्या विभुती । भिन्न प्रारब्धाची गती ॥ध्रु.॥ एकांचीं वचनें । कडु अत्यंत तीक्षणें ॥2॥ प्रकाराचें तीन । तुका ह्मणे केलें जन ॥3॥ 720 वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥1॥ दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥ अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥2॥ बीज पृथिवीच्या पोटीं । तुका ह्मणे दावी दृष्टी ॥3॥ 721 विचारा वांचून । न पवीजे समाधान ॥1॥ देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥ देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥2॥ तुका ह्मणे होतें । बहु गोमटें उचितें ॥3॥ 722 तुटे भवरोग । संचितक्रियमाणभोग ॥1॥ ऐसें विठोबाचें नाम । उच्चारितां खंडे जन्म ॥ध्रु.॥ वसों न सके पाप । पळे त्रिविध तो ताप ॥2॥ तुका ह्मणे माया । होय दासी लागे पायां ॥3॥ 723 मुसावलें अंग । रंगीं मेळविला रंग ॥1॥ एकीं एक दृढ जालें । मुळा आपुलिया आलें ॥ध्रु.॥ सागरीं थेंबुडा । पडिल्या निवडे कोण्या वाटा ॥2॥ तुका ह्मणे नवें । नव्हे जाणावें हें देवें ॥3॥ 724 अनुतापें दोष । जाय न लगतां निमिष ॥1॥ परि तो राहे विसावला । आदीं अवसानीं भला ॥ध्रु.॥ हें चि प्रायिश्चत । अनुतापीं न्हाय चित्त ॥2॥ तुका ह्मणे पापा । शिवों नये अनुतापा ॥3॥ 725 चहूं आश्रमांचे धर्म । न राखतां जोडे कर्म ॥1॥ तैसी नव्हे भोळी सेवा । एक भाव चि कारण देवा ॥ध्रु.॥ तपें इंिद्रयां आघात । क्षणें एका वाताहात ॥2॥ मंत्र चळे थोडा । तरि धड चि होय वेडा ॥3॥ व्रतें करितां सांग । तरी एक चुकतां भंग ॥4॥ धर्म सkव चि कारण । नाहीं तरी केला सिण ॥5॥ भूतदयेसि आघात । उंचनिच वाताहात ॥6॥ तुका ह्मणे दुजें । विधिनिषेधाचें ओझें ॥7॥ 726 सोडिला संसार । माया तयावरि फार ॥1॥ धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥ यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥2॥ तुका ह्मणे भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥3॥ 727 बैसों खेळूं जेवूं । तेथें नाम तुझें गाऊं ॥1॥ रामकृष्णनाममाळा । घालूं ओवुनियां गळा ॥ध्रु.॥ विश्वास हा धरूं। नाम बळकट करूं ॥2॥ तुका ह्मणे आतां । आह्मां जीवन शरणागतां ॥3॥ 728 पाटीं पोटीं देव । कैचा हरिदासां भेव ॥1॥ करा आनंदें कीर्तन । नका आशंकितमन ॥ध्रु.॥ एथें कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥2॥ तुका ह्मणे धनी । सपुरता काय वाणी ॥3॥ 729 मनोमय पूजा । हे चि पढीयें केशीराजा ॥1॥ घेतो कल्पनेचा भोग । न मानेती बाहए रंग ॥ध्रु.॥ अंतरींचें जाणे । आदिवर्तमान खुणे ॥2॥ तुका ह्मणे कुडें । कोठें सरे त्याच्या पुढें ॥3॥ 730 जाणे भHीचा जिव्हाळा । तो चि देवीचा पुतळा ॥1॥ आणीक नये माझ्या मना । हो का पंडित शाहाणा ॥ध्रु.॥ नामरूपीं जडलें चित्त । त्याचा दास मी अंकित ॥2॥ तुका ह्मणे नवविध । भिH जाणे तो चि शुद्ध ॥3॥ 731 याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥1॥ माझें दिठावेल प्रेम । बुिद्ध होइऩल निष्काम ॥ध्रु.॥ अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥2॥ तुका ह्मणे अहंब्रह्म । आड येऊं नेदीं भ्रम ॥3॥ 732 बुडतां आवरीं । मज भवाचे सागरीं ॥1॥ नको मानूं भार । पाहों दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी ॥2॥ तुका ह्मणे दोषी । मी तों पातकांची राशी ॥3॥ 733 अक्षइऩ तें झालें । आतां न मोडे रचिलें ॥1॥ पाया पडिला खोले ठायीं । तेथें पुढें चाली नाहीं ॥ध्रु.॥ होतें विखुरलें । ताळा जमे झडती आलें ॥2॥ तुका ह्मणे बोली । पुढें कुंटित चि जाली ॥3॥ 734 तुझे थोर थोर । भH करिती विचार ॥1॥ जपतपादि साधनें । मज चिंतवेना मनें ॥ध्रु.॥ करुणावचनें । म्यां भाकावीं तुह्मां दीनें ॥2॥ तुका ह्मणे घेइप । माझें थोडें फार ठायीं ॥3॥ 735 लावुनि काहाळा । सुखें करितों सोहोळा ॥1॥ सादवीत गेलों जना । भय नाहीं सत्य जाणां ॥ध्रु.॥ गात नाचत विनोदें । टाळघाग†यांच्या छंदें ॥2॥ तुका ह्मणे भेव । नाहीं पुढें येतो देव ॥3॥ 736 मुH कासया ह्मणावें । बंधन तें नाहीं ठावें ॥1॥ सुखें करितों कीर्तन । भय विसरलें मन ॥ध्रु.॥ देखिजेना नास । घालूं कोणावरी कास ॥2॥ तुका ह्मणे साहे । देव आहे तैसा आहे ॥3॥ 737 ओनाम्याच्या काळें । खडें मांडविलें बाळें ॥1॥ तें चि पुढें पुढें काइऩ । मग लागलिया सोइऩ ॥ध्रु.॥ रज्जु सर्प होता । तोंवरी चि न कळतां ॥2॥ तुका ह्मणे साचें । भय नाहीं बागुलाचें ॥3॥ 738 आतां पुढें धरीं । माझे आठव वैखरी ॥1॥ नको बडबडूं भांडे । कांहीं वाउगें तें रांडें ॥ध्रु.॥ विठ्ठल विठ्ठल । ऐसे सांडुनियां बोल ॥2॥ तुका ह्मणे आण । तुज स्वामीची हे जाण ॥3॥ 739 काय नव्हे करितां तुज । आतां राखें माझी लाज ॥1॥ मी तों अपराधाची राशी । शिखा अंगुष्ट तोंपाशीं ॥ध्रु.॥ त्राहें त्राहें त्राहें । मज कृपादृष्टी पाहें ॥2॥ तुका ह्मणे देवा । सत्या घ्यावी आतां सेवा ॥3॥ 740 वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥1॥ तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥ गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥2॥ तुका ह्मणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥3॥ 741 पूजा पुज्यमान । कथे उभे हरिजन ॥1॥ ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥ देहाचा विसर । केला आनंदें संचार ॥2॥ गेला अभिमान । लाज बोळविला मान ॥3॥ शोक मोह चिंता । याची नेणती ते वार्ता ॥4॥ तुका ह्मणे सखे । विठोबा च ते सारिखे ॥5॥ 742 भाव तैसें फळ । न चले देवापाशीं बळ ॥1॥ धांवे जातीपाशीं जाती । खुण येरयेरां चित्तीं ॥ध्रु.॥ हिरा हिरकणी । काढी आंतुनि आहिरणी ॥2॥ तुका ह्मणे केलें । मन शुद्ध हें चांगलें ॥3॥ 743 वरि बोला रस । कथी Yाान माजी फोस ॥1॥ ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥ परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥2॥ तुका ह्मणे हाडें । कुत†या लाविलें झगडें ॥3॥ 744 हे चि तुझी पूजा । आतां करीन केशीराजा ॥1॥ अवघीं तुझींच हें पदें । नमस्कारीन अभेदें ॥ध्रु.॥ न वजिऩतदिशा । जाय तेथें चि सरिसा ॥2॥ नव्हे एकदेशी । तुका ह्मणे गुणदोषीं ॥3॥ 745 आपलें तों कांहीं । येथें सांगिजेसें नाहीं ॥1॥ परि हे वाणी वायचळ । छंद करविते बरळ ॥ध्रु.॥ पंचभूतांचा हा मेळा । देह सत्यत्वें निराळा ॥2॥ तुका ह्मणे भुली । इच्या उफराटएा चाली ॥3॥ 746 विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥1॥ कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥ न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥2॥ तुका ह्मणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥3॥ 747 कृपावंत किती । दीनें बहु आवडती ॥1॥ त्यांचा भार वाहे माथां । करी योगक्षेमचिंता ॥ध्रु.॥ भुलें नेदी वाट । करीं धरूनि दावी नीट ॥2॥ तुका ह्मणे जीवें । अनुसरतां एका भावें ॥3॥ 748 नेणती वेद श्रुति कोणी । आह्मां भाविकां वांचुनी ॥1॥ रूप आवडे आह्मांशी । तैसी जोडी हृषीकेशी ॥ध्रु.॥ आह्मीं भावें बिळवंत। तुज घालूं हृदयांत ॥2॥ तुका ह्मणे तुज धाक । देतां पावसील हाक ॥3॥ 749 मन गुंतलें लुलयां । जाय धांवोनि त्या ठाया ॥1॥ मागें परती तो बळी । शूर एक भूमंडळीं ॥ध्रु.॥ येऊनियां घाली घाला । नेणों काय होइऩ तुला ॥2॥ तुका ह्मणें येणें । बहु नाडिले शाहाणे ॥3॥ 750 घेइप माझे वाचे । गोड नाम विठोबाचें ॥1॥ तुह्मी घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचें मुख ॥ध्रु.॥ तुह्मी ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥2॥ मना तेथें धांव घेइप । राहें विठोबाचे पायीं ॥3॥ तुका ह्मणे जीवा । नको सोडूं या केशवा ॥4॥ 751 धणी न पुरे गुण गातां । रूप दृष्टी न्याहािळतां ॥1॥ बरवा बरवा पांडुरंग । कांति सांवळी सुरंग ॥ध्रु.॥ सर्वमंगळाचें सार। मुख सिद्धीचें भांडार ॥2॥ तुका ह्मणे सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥3॥ 752 जरी मी नव्हतों पतित । तरि तूं पावन कैंचा येथ ॥1॥ ह्मणोनि माझें नाम आधीं । मग तूं पावन कृपानिधी ॥ध्रु.॥ लोहो महिमान परिसा । नाहीं तरीं दगड जैसा ॥2॥ तुका ह्मणे याचकभावें। कल्पतरु मान पावे ॥3॥ 753 एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युHी ॥1॥ कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥ आठव चि पुरे । सुख अवघें मोहो रे ॥2॥ तुका ह्मणे मन । पूजा इच्छी नारायण ॥3॥ 754 मज संतांचा आधार । तूं एकलें निविऩकार ॥1॥ पाहा विचारूनि देवा । नको आह्मांसवें दावा ॥ध्रु.॥ तुज बोल न बोलवे। आह्मां भांडायाची सवे ॥2॥ तुका ह्मणे तरी । ऐक्यभाव उरे उरी ॥3॥ 755 तुज मागणें तें देवा । आह्मां तुझी चरणसेवा ॥1॥ आन नेघों देसी तरी । रििद्ध सििद्ध मुिH चारी ॥ध्रु.॥ संतसंगति सर्वकाळ । थोर प्रेमाचा सुकाळ ॥2॥ तुका ह्मणे नाम । तेणें पुरे माझें काम ॥3॥ 756 तुझा शरणागत । जन्मोजन्मींचा अंकित ॥1॥ आणीक नेणें कांहीं हेवा । तुजवांचूनि केशवा ॥ध्रु.॥ हें चि माझें गाणें । तुझें नामसंकीर्तन ॥2॥ तुझ्या नामाचीं भूषणें । तुका म्हणे ल्यालों लेणें ॥3॥ 757 उतरलों पार । सत्य झाला हा निर्धार ॥1॥ तुझें नाम धरिलें कंठीं । केली संसारासी तुटी ॥ध्रु.॥ आतां नव्हे बाधा । कोणेविशीं कांहीं कदा ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । आतां उरलें ऐसें नाहीं ॥3॥ 758 क्रियामतिहीन । एक मी गा तुझें दीन ॥1॥ देवा करावा सांभाळ । वारीं माझी तळमळ ॥ध्रु.॥ नको माझे ठायीं । गुणदोष घालूं कांहीं ॥2॥ अपराधाच्या कोटी । तुका ह्मणे घालीं पोटीं ॥3॥ 759 नाहीं निर्मळ जीवन । काय करील साबण ॥1॥ तैसी चित्तशुिद्ध नाहीं । तेथें बोध करील काइऩ ॥ध्रु.॥ वृक्ष न धरी पुष्पफळ । काय करील वसंतकाळ ॥2॥ वांजे न होती लेकरें । काय करावें भ्रतारें ॥3॥ नपुंसका पुरुषासी । काय करील बाइल त्यासी ॥4॥ प्राण गेलिया शरीर । काय करील वेव्हार ॥5॥ तुका ह्मणे जीवनेंविण । पीक नव्हे नव्हे जाण ॥6॥ 760 नवां नवसांचीं । जालों तुह्मासी वाणीचीं ॥1॥ कोण तुझें नाम घेतें । देवा पिंडदान देतें ॥ध्रु.॥ कोण होतें मागें पुढें । दुजें बोलाया रोकडें ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । कोणा घेतासि वो संगा ॥3॥ 761 एका बीजा केला नास । मग भोगेल कणीस ॥1॥ कळे सकळां हा भाव । लाहानथोरांवरी जीव ॥ध्रु.॥ लाभ नाहीं फुकासाठीं । केल्यावीण जीवासाठीं ॥2॥ तुका ह्मणे रणीं । जीव देतां लाभ दुणी ॥3॥ 762 आयुष्य गेलें वांयांविण । थोर झाली नागवण ॥1॥ आतां धांवें धांवें तरी । काय पाहातोसि हरी ॥ध्रु.॥ माझे तुझे या चि गती । दिवस गेले तोंडीं माती ॥2॥ मन वाव घेऊं नेदी । बुडवूं पाहे भवनदी ॥3॥ पडिला विषयाचा घाला । तेणें नागविलें मला ॥4॥ शरण आलों आतां धांवें । तुका ह्मणे मज पावें ॥5॥ 763 सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥1॥ त्याचा हा चि उपकार । अंतीं आह्माशीं वेव्हार ॥ध्रु.॥ नामरूपा केला ठाव। तुज कोण ह्मणतें देव ॥2॥ तुका ह्मणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥3॥ 764 आपुलें मागतां । काय नाहीं आह्मां सत्ता ॥1॥ परि या लौकिकाकारणें । उरीं ठेविली बोलणें ॥ध्रु.॥ ये चि आतां घडी । करूं बैसों ते ची फडी ॥2॥ तुका ह्मणे करितों तुला । ठाव नाहींसें विठ्ठला ॥3॥ 765 असो आतां किती । तुज यावें काकुलती ॥1॥ माझें प्रारब्ध हें गाढें । तूं बापुडें तयापुढें ॥ध्रु.॥ सोडवीन आतां । ब्रीदें तुझीं पंढरीनाथा ॥2॥ तुका ह्मणे बळी । तो गांढएाचे कान पिळी ॥3॥ 766 काय नव्हे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥1॥ सर्व- साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥ योगायागतपें । केलीं तयानें अमुपें ॥2॥ तुका म्हणे जपा । मंत्र तीं अक्षरी सोपा ॥3॥ 767 हो कां दुराचारी । वाचे नाम जो उच्चारी ॥1॥ त्याचा दास मी अंकित । कायावाचामनेंसहित ॥ध्रु.॥ नसो भाव चित्तीं । हरिचे गुण गातां गीतीं ॥2॥ करी अनाचार । वाचे हरिनामउच्चार ॥3॥ हो कां भलतें कुळ । शुचि अथवा चांडाळ ॥4॥ ह्मणवी हरिचा दास । तुका ह्मणे धन्य त्यास ॥5॥ 768 हाकेसरिसी उडी । घालूनियां स्तंभ फोडी ॥1॥ ऐसी कृपावंत कोण । माझे विठाइऩवांचून ॥ध्रु.॥ करितां आठव । धांवोनियां घाली कव ॥2॥ तुका ह्मणे गीती गातां । नामें द्यावी सायुज्यता ॥3॥ 769 लोह चुंबकाच्या बळें । उभें राहिलें निराळें ॥1॥ तैसा तूं चि आह्मांठायीं । खेळतोसी अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ भक्ष अग्नीचा तो दोरा । त्यासि वांचवी मोहरा ॥2॥ तुका ह्मणे अधीलपणें । नेली लांकडें चंदनें ॥3॥ 770 डोइऩ वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥1॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥ मेळवूनि नरनारी। शकुन सांगती नानापरी ॥2॥ तुका ह्मणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥3॥ 771 गाढवाचे घोडे । आह्मी करूं दृष्टीपुढें ॥1॥ चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥ध्रु.॥ सोंगसंपादनी । तरि करूं शुद्ध वाणी ॥2॥ तुका ह्मणे खळ । करूं समयीं निर्मळ ॥3॥ 772 बाइऩल मेली मुH जाली । देवें माया सोडविली ॥1॥ विठो तुझें माझें राज्य । नाहीं दुस†याचें काज ॥ध्रु.॥ पोर मेलें बरें जालें । देवें मायाविरहित केलें ॥2॥ माता मेली मज देखतां । तुका ह्मणे हरली चिंता ॥3॥ 773 योग तप या चि नांवें । गिळत व्हावें अभिमानें ॥1॥ करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥ तरि खंडे येरझार। निघे भार देहाचा ॥2॥ तुका ह्मणे मानामान । हें बंधन नसावें ॥3॥ 774 करी संध्यास्नान । वारी खाउनियां अन्न ॥1॥ तया नाहीं लाभहानी । आदा वेंचाचिये मानीं ॥ध्रु.॥ मजुराचें धन । विळा दोर चि जतन ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । अधीरासी देव कांहीं ॥3॥ 775 वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥1॥ नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥ अंगुिळया मोडी। त्यासी काय सिलें घोडीं ॥2॥ नपुंसकासाठीं । तुका ह्मणे न लगे जेठी ॥3॥ 776 वर्णाश्रम करिसी चोख । तरि तूं पावसी उत्तम लोक ॥1॥ तुजला तें नाहीं ठावें । जेणें अंगें चि ब्रह्म व्हावें ॥ध्रु.॥ जरि तूं जालासी पंडित । करिसी शब्दाचें पांडित्य ॥2॥ गासी तान मान बंध । हाव भाव गीत छंद ॥3॥ जाणसील तूं स्वतंत्र । आगमोH पूजायंत्र ॥4॥ साधनाच्या ओढी । डोिळयांच्या मोडामोडी ॥5॥ तुका ह्मणे देहीं । संत जाहाले विदेही ॥6॥ 777 प्रेमसूत्र दोरी । नेतो तिकडे जातों हरी ॥1॥ मनेंसहित वाचा काया । अवघें दिलें पंढरीराया ॥ध्रु.॥ सत्ता सकळ तया हातीं। माझी कींव काकुलती ॥2॥ तुका ह्मणे ठेवी तैसें । आह्मी राहों त्याचे इच्छे ॥3॥ 778 पाववील ठाया । पांडुरंग चिंतिलिया ॥1॥ त्यासी चिंतिलिया मनीं । चित्ता करी गंवसणी ॥ध्रु.॥ पावावया फळ । अंगीं असावें हें बळ ॥2॥ तुका ह्मणे तइप । सििद्ध वोळगती पायीं ॥3॥ 779 धन्य भावशीळ । ज्याचें हृदय निर्मळ ॥1॥ पूजी प्रतिमेचे देव । संत ह्मणती तेथें भाव ॥ध्रु.॥ विधिनिषेध नेणती । एक निष्ठा धरुनी चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे तैसें देवा । होणें लागे त्यांच्या भावा ॥3॥ 780 आधीं च आळशी । वरी गुरूचा उपदेशी ॥1॥ मग त्या कैंची आडकाठी । विधिनिषेधाची भेटी ॥ध्रु.॥ नाचरवे धर्म । न करवे विधिकर्म ॥2॥ तुका ह्मणे ते गाढव । घेती मनासवें धांव ॥3॥ 781 नाचे टाळी पिटी । प्रेमें अंग धरणीं लोटी ॥1॥ माझे सखे ते सज्जन । भोळे भाविक हरिजन ॥ध्रु.॥ न धरिती लाज । नाहीं जनासवें काज ॥2॥ तुका ह्मणे दाटे । कंठ नेत्रीं जळ लोटे ॥3॥ 782 टिळा टोपी माळा देवाचें गवाळें । वागवी वोंगळ पोटासाटीं ॥1॥ तुळसी खोवी कानीं दर्भ खोवी शेंडी । लटिकी धरी बोंडी नासिकाची ॥ध्रु.॥ कीर्तनाचे वेळे रडे पडे लोळे । प्रेमेंविण डोळे गळताती ॥2॥ तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥3॥ 783 धन्य देहूं गांव पुण्य भूमि ठाव । तेथें नांदे देव पांडुरंग ॥1॥ धन्य क्षेत्रवासी लोक दइवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥ध्रु.॥ कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगीं ते माता रखुमादेवी ॥2॥ गरुड पारीं उभा जोडुनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामुख ॥3॥ दिक्षणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥4॥ लIमीनारायण बल्लाळाचें वन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्वर ॥5॥ विघ्नराज द्वारीं बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारीं सहित दोघे ॥6॥ तेथें दास तुका करितो कीर्तन । हृदयीं चरण विठोबाचे ॥7॥ शाHावर - अभंग 13 784 टंवकारूनि दृष्टी लावुनियां रंग । दावी झगमग डोऑयांपुढें ॥1॥ ह्मणती शिष्यासी लागली समाधी । लटकी चि उपाधी झकविती ॥ध्रु.॥ दीपाचिया ज्योती कोंडियेलें तेज । उपदेश सांजरात्रीमाजी ॥2॥ रांगोिळया चौक शृंगारुनी वोजा । आवरण पूजा यंत्र करी ॥3॥ पडदा लावोनियां दीप चहूं कोनीं । बैसोनि आसनीं मुद्रा दावी ॥4॥ नैवेद्यासी ह्मणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥5॥ जाला उपदेश कवळ घ्या रे मुखीं । आपोशन शेखीं बुडविलें ॥6॥ पाषांड करोनि मांडिली जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥7॥ कायावाचामनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥8॥ शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥9॥ विधीचा ही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥10॥ योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥11॥ वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥12॥ तुका ह्मणे गेलें गुरुत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नर्कवासा ॥13॥ 785 शाH गधडा जये देशीं । तेथें राशी पापाच्या ॥1॥ सुकृताचा उदो केला । गोंधळ घाला इंिद्रयें ॥ध्रु.॥ क्रोधरूपें वसे काम । तीचें नाम जपतसे ॥2॥ मद्यभक्षण मांगिण जाती । विटाळ चित्तीं सांटविला ॥3॥ स्तवुनियां पूजी रांड । न लजे भांड दाढीसी ॥4॥ तुका ह्मणे भगवती । नेइल अंतीं आपणापें ॥5॥ 786 राजा प्रजा द्वाड देश । शाH वास करिती तो ॥1॥ अधर्माचें उबड पीक । धर्म रंक त्या गांवीं ॥ध्रु.॥ न पिके भूमि कांपे भारें । मेघ वारें पीतील ॥2॥ तुका ह्मणे अवघीं दुःखें । येती सुखें वस्तीसी ॥3॥ 787 ऐसें कलियुगाच्या मुळें । जालें धर्माचें वाटोळें ॥1॥ सांडुनियां रामराम । ब्राह्मण ह्मणती दोमदोष ॥ध्रु.॥ शिवों नये तीं निळीं । वस्त्रें पांघरती काळीं ॥2॥ तुका ह्मणे वृित्त । सांडुनि गदा मागत जाती ॥3॥ 788 अवघ्या पापें घडला एक । उपासक शHीचा ॥1॥ त्याचा विटाळ नको अंगा । पांडुरंगा माझिया ॥ध्रु.॥ काम क्रोध मद्य अंगीं । रंगला रंगीं अवगुणी ॥2॥ करितां पाप न धरी शंका। ह्मणे तुका कोणी ही ॥3॥ 789 वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥1॥ रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥ जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥2॥ तुका ह्मणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥3॥ 790 शाHांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥1॥ तिची त्या पडली सवे । मागें धांवें ह्मणोनि ॥ध्रु.॥ शाHांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥2॥ तुका ह्मणे शिंदळीचे । बोलतां वाचे निंद्य ते ॥3॥ 791 हरिहर सांडूनि देव । धरिती भाव क्षुल्लकीं ॥1॥ ऐका त्यांची विटंबणा । देवपणा भHांची ॥ध्रु.॥ अंगीं कवडे घाली गळां । परडी कळाहीन हातीं ॥2॥ गळां गांठा हिंडें दारीं । मनुष्य परी कुतरीं तीं ॥3॥ माथां सेंदुर दांत खाती । जेंगट हातीं सटवीचें ॥4॥ पूजिती विकट दौंद । पशु सोंड गजाची ॥5॥ ऐशा छंदें चुकलीं वाटा । भाव खोटा भजन ॥6॥ तुका ह्मणे विष्णुशिवा । वांचुनि देवा भजती ती ॥7॥ 792 कांद्यासाठी जालें Yाान । तेणें जन नाडिलें ॥1॥ ऐकाकाम क्रोध बुचबुची । भुंके पुची व्यालीची ॥ध्रु.॥ पूजेलागीं द्रव्य मागे।काय सांगे शिष्यातें ॥2॥ तुका ह्मणे कैंचें ब्रह्म । अवघा भ्रम विषयांचा॥3॥ 793 सांडुनियां पंढरीराव । कवणातें ह्मणों देव ॥1॥ बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव ह्मणतां ॥ध्रु.॥ सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥2॥ तुका ह्मणे हरिहर । ऐसी सांडुनियां धुर ॥3॥ 794 बहुतें गेलीं वांयां । न भजतां पंढरीराया ॥1॥ करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥ध्रु.॥ अवघियांचा धनी । त्यासी गेलीं विसरोनि ॥2॥ तुका ह्मणे अंतीं । पडती यमाचिया हातीं ॥3॥ 795 असो आतां ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवूं ॥1॥ रिक्षता तूं होसी जरी । तरि काय येरीं करावें ॥ध्रु.॥ काया वाचा मन पायीं । राहे ठायीं करूं तें ॥2॥ तुका ह्मणे गाइन गीतीं । रूप चित्तीं धरूनियां ॥3॥ 796 नाहीं आह्मी विष्णुदास । करीत आस कोणांची ॥1॥ कां हे नष्ट करिती निंदा । नेणों सदा आमुची ॥ध्रु.॥ असों भलते ठायीं मनें । समाधानें आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे करूं देवा । तुझी सेवा धंदा तो ॥3॥ ॥13॥ 797 पाखांडएांनीं पाठी पुरविला दुमाला । तेथें मी विठ्ठला काय बोलों ॥1॥ कांद्याचा खाणार चोजवी कस्तुरी । आपुलें भिकारी अर्थ नेणे ॥ध्रु.॥ न कळे तें मज पुसती छळूनी । लागतां चरणीं न सोडिती ॥2॥ तुझ्या पांयांविण दुजें नेणें कांहीं । तूं चि सर्वांठायीं एक मज ॥3॥ तुका ह्मणे खीळ पडो त्यांच्या तोंडा । किती बोलों भांडां वादकांशीं ॥4॥ 798 कलियुगीं कवित्व करिती पाषांड । कुशळ हे भांड बहु जाले ॥1॥ द्रव्य दारा चित्तीं प्रजांची आवडी । मुखें बडबडी कोरडा चि ॥ध्रु.॥ डंव करी सोंग मानावया जग । मुखें बोले त्याग मनीं नाहीं ॥2॥ वेदाYो करोनि न करिती स्वहित । नव्हती अलिप्त देहाहुनी ॥3॥ तुका ह्मणे दंड साहील यमाचे । न करी जो वाचे बोले तैसें ॥4॥ 799 विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥1॥ मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥ असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥2॥ तप्तभूमीवरि लोळविती पाहीं । अिग्नस्तंभ बाहीं कवळविती ॥3॥ ह्मणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आतां योनी गर्भवास ॥4॥ 800 अल्प माझी मती । ह्मणोनि येतों काकुलती ॥1॥ आतां दाखवा दाखवा । मज पाउलें केशवा ॥ध्रु.॥ धीर माझ्या मना। नाहीं नाहीं नारायणा ॥2॥ तुका ह्मणे दया । मज करा अभागिया ॥3॥ 801 वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥1॥ तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥2॥ तुका ह्मणे माझ्या असांवल्या बाहएा । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥3॥ 802 देह हा सादर पाहावा नििश्चत । सर्व सुख एथें नाम आहे ॥1॥ ब्रह्म जें देखणें द्वैत जेव्हां गेलें । शरीर तें जालें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥ यजन याजन तप व्रतें करिती । विकल्पें नागवती शुद्ध पुण्या ॥2॥ तुका ह्मणे सर्व सुख एथें आहे । भ्रांति दूर पाहें टाकुनियां ॥3॥ ॥13॥ 803 तुझे वणूप गुण ऐसी नाहीं मती । राहिल्या त्या श्रुती मौन्यपणें ॥1॥ मौन्यपणें वाचा थोंटावल्या चारी । ऐसें तुझें हरी रूप आहे ॥ध्रु.॥ रूप तुझें ऐसें डोळां न देखवे । जेथें हें झकवे ब्रह्मादिक ॥2॥ ब्रह्मादिक देवा कर्माची कचाटी । ह्मणोनि आटाटी फार त्यांसी ॥3॥ तुका ह्मणे तुझें गुण नाम रूप । आहेसी अमुप वाणूं काइऩ ॥4॥ 804 मनवाचातीत तुझें हें स्वरूप । ह्मणोनियां माप भिH केलें ॥1॥ भHीचिया मापें मोजितों अनंता । इतरानें तत्वता न मोजवे ॥ध्रु.॥ योग याग तपें देहाचिया योगें । Yाानाचिया लागें न सांपडेसी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी भोऑया भावें सेवा । घ्यावी जी केशवा करितों ऐसी ॥3॥ 805 देवा ऐसा शिष्य देइऩ । ब्रह्मYाानी निपुण पाहीं ॥1॥ जो कां भावाचा आगळा । भिHप्रेमाचा पुतळा ॥ध्रु.॥ ऐशा युिH ज्याला बाणे । तेथें वैराग्याचें ठाणें ॥2॥ ऐसा जाला हो शरीरीं । तुका लिंबलोण करी ॥3॥ 806 जंव नाहीं देखिली पंढरी । तोंवरी वणिऩसी थोर वैकुंठींची ॥1॥ मोक्षसििद्ध तेथें हिंडे दारोदारीं । होऊनि कामारी दीनरूप ॥ध्रु.॥ वृंदावन सडे चौक रंग माळा । अभिन्नव सोहोळा घरोघरीं ॥2॥ नामघोष कथापुराणकीर्तनीं । ओविया कांडणीं पांडुरंग ॥3॥ सर्व सुख तेथें असे सर्वकाळ । ब्रह्म तें केवळ नांदतसे ॥4॥ तुका ह्मणे जें न साधे सायासें । तें हें प्रत्यक्ष दिसे विटेवरि ॥5॥ 807 दुःख वाटे ऐसी ऐकोनियें गोष्टी । जेणें घडे तुटी तुझ्या पायीं ॥1॥ येतो कळवळा देखोनियां घात । करितों फजित नाइकती ॥ध्रु.॥ काय करूं देवा ऐसी नाहीं शिH । दंडुनि पुढती वाटे लावूं ॥2॥ तुका ह्मणे मज दावूं नको ऐसे । दृष्टीपुढें पिसे पांडुरंगा ॥3॥ 808 शूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥1॥ तेवीं अभHांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥ श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरि ॥2॥ तुका ह्मणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥3॥ 809 रासभ धुतला महा तीर्थांमाजी । नव्हे जैसा तेजी शामकर्ण ॥1॥ तेवीं खळा काय केला उपदेश । नव्हे चि मानस शुद्ध त्याचें ॥ध्रु.॥ सर्पासी पाजिलें शर्करापीयूष । अंतरींचें विष जाऊं नेणे ॥2॥ तुका ह्मणे श्वाना िक्षरीचें भोजन । सवें चि वमन जेवी तया ॥3॥ 810 जेवीं नवज्वरें तापलें शरीर । लागे तया क्षीर विषातुल्य ॥1॥ तेवीं परमार्थ जीहीं दुराविला । तयालागीं झाला सन्निपात ॥ध्रु.॥ कामिनी जयाच्या जाहाली नेत्रासी । देखी तो चंद्रासी पीतवर्ण ॥2॥ तुका ह्मणे मद्यपानाची आवडी । न रुचे त्या गोडी नवनीताची ॥3॥ 811 आतां असों मना अभHांची कथा । न होइप दुिश्चता हरिनामीं ॥1॥ नये त्याची कदा गोष्टी करूं मात । जिव्हे प्रायिश्चत्त त्याच्या नांवें ॥ध्रु.॥ प्रभातें न घ्यावें नांव माकडाचें । तैसें अभHाचें सर्वकाळ ॥2॥ तुका ह्मणे आतां आठवूं मंगळ । जेणें सर्व काळ सुखरूप ॥3॥ 812 नाम आठवितां सद्गदित कंठीं । प्रेम वाढे पोटीं ऐसें करीं ॥1॥ रोमांच जीवन आनंदाश्रु नेत्रीं । अष्टांग ही गात्रीं प्रेम तुझें ॥ध्रु.॥ सर्व ही शरीर वेचो या कीर्तनीं । गाऊं निशिदिनीं नाम तुझें ॥2॥ तुका ह्मणे दुजें न करीं कल्पांतीं । सर्वदा विश्रांति संतां पाइप ॥3॥ 813 जननी हे जाणे बाळकाचें वर्म । सुख दुःख धर्म जें जें कांहीं ॥1॥ अंधापुढें जेणें दिधला आधार । त्याचा हा विचार तो चि जाणे ॥ध्रु.॥ शरणागता जेणें घातलें पाठीशीं । तो जाणे तेविशीं राखों तया ॥2॥ कासे लागे तया न लगती सायास । पोहोणारा त्यास पार पावी ॥3॥ तुका ह्मणे जीव विठ्ठलाचे हातीं । दिला त्याची गति तो चि जाणे ॥4॥ 814 नका वांटूं मन विधिनिषेधांसी । स्मरावा मानसीं पांडुरंग ॥1॥ खादलिया अन्ना मासी बोलों नये । अवघें चि जाये एका घांसें ॥ध्रु.॥ जोडी होते परी ते बहु कठिण । करितां जतन सांभाळावें ॥2॥ तुका ह्मणें येथें न मना विषाद । निंबेंविण व्याध तुटों नये ॥3॥ 815 नको होऊं देऊं भावीं अभावना । या चि नांवें जाणा बहु दोष ॥1॥ मेघवृिष्ट येथें होते अनिवार । जिव्हाऑयां उखर लाभ नाड ॥ध्रु.॥ उत्तमा विभागें कनिष्ठाची इच्छा । कल्पतरु तैसा फळे त्यासी ॥2॥ तुका ह्मणे जिणें बहु थोडें आहे । आपुलिया पाहें पुढें बरें ॥3॥ 816 त्याग तंव मज न वजतां केला । कांहीं च विठ्ठला मनांतूनि ॥1॥ भागलिया आला उबग सहज । न धरितां काज जालें मनीं ॥ध्रु.॥ देह जड जालें ॠणाच्या आभारें । केलें संवसारें कासावीस ॥2॥ तुका ह्मणे गेला आळसकिळस । अकर्तव्य दोष निवारिले ॥3॥ 817 मढें झांकुनियां करिती पेरणी । कुणबियाचे वाणी लवलाहें ॥1॥ तयापरी करीं स्वहित आपुलें । जयासी फावलें नरदेह ॥ध्रु.॥ ओटीच्या परिस मुठीचें तें वाढे । यापरि कैवाडें स्वहिताचें ॥2॥ नाहीं काळसत्ता आपुलिये हातीं । जाणते हे गुंती उगविती ॥3॥ तुका ह्मणे पाहें आपुली सूचना । करितो शाहाणा मृत्युलोकीं ॥4॥ 818 राजा चाले तेथें वैभव सांगातें । हें काय लागतें सांगावें त्या ॥1॥ कोणी कोणा एथें न मनी जी फुका । कृपेविण एका देवाचिया ॥ध्रु.॥ शृंगारिलें नाहीं तगोंयेत वरि । उमटे लौकरि जैसे तैतें ॥2॥ तुका ह्मणे घरीं वसे नारायण । कृपेची ते खुण साम्या येते ॥3॥ 819 वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥1॥ शिकविलें काय येइऩल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥ सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । ह्मणऊनि लाता मागें सारी ॥2॥ तुका ह्मणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥3॥ 820 देवाच्या संबंधें विश्व चि सोयरें । सूत्र ओढे दोरें एका एक ॥1॥ आहाच हें नव्हे विटायासारिखें । जीव जीवनीं देखें सामावलें ॥ध्रु.॥ आणिकांचें सुख दुःख उमटे अंतरीं । एथील इतरीं तेणें न्यायें ॥2॥ तुका ह्मणे ठसावलें शुद्ध जाती । शोभा चि पुढती विशेषता ॥3॥ 821 अवघा वेंचलों इंिद्रयांचे ओढी । जालें तें तें घडी निरोपिलें ॥1॥ असावा जी ठावा सेवेसी विचार । आपुला म्यां भार उतरिला ॥ध्रु.॥ कायावाचामनें तो चि निजध्यास । एथें जालों ओस भिHभावें ॥2॥ तुका ह्मणे करूं येइऩल धावणें । तरि नारायणें सांभाळावें ॥3॥ 822 राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥1॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥ होइऩल येणें कळसा आलें । िस्थरावलें अंतरीं ॥2॥ तुका ह्मणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥3॥ 823 आदि मध्य अंत दाखविला दीपें । हा तों आपणापें यत्न बरा ॥1॥ दाशkवें दाविलें धन्याचें भांडार । तोंतों नव्हे सार एथुनियां ॥ध्रु.॥ उपायानें सोस नासला सकळ । सत्ते सत्ताबळ अंगा आलें ॥2॥ तुका ह्मणे दृिष्ट सकळांचे शिरीं । वचन चि करी बैसोनियां ॥3॥ 824 सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥1॥ जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥ध्रु.॥ निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥2॥ तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥3॥ 825 लागलिया मुख स्तनां । घाली पान्हा माउली ॥1॥ उभयतां आवडी लाडें । कोडें कोड पुरतसे ॥ध्रु.॥ मेळवितां अंगें अंग । प्रेमें रंग वाढतो ॥2॥ तुका ह्मणे जड भारी । अवघें शिरीं जननीचे ॥3॥ 826 अवगुण तों कोणीं नाहीं प्रतििष्ठले । मागें होत आले शिष्टाचार ॥1॥ दुर्बळाच्या नांवें पिटावा डांगोरा । हा तों नव्हे बरा सत्यवाद ॥ध्रु.॥ मद्य आणि मधु एकरासी नांवें । तरि कां तें खावें आधारें त्या ॥2॥ तुका ह्मणे माझा उिच्छष्ट प्रसाद । निवडी भेदाभेद वृिष्टन्यायें ॥3॥ 827 भूतीं भगवंत । हा तों जाणतों संकेत ॥1॥ भारी मोकलितों वाण । ज्याचा त्यासी कळे गुण ॥ध्रु.॥ करावा उपदेश। निवडोनि तरि दोष ॥2॥ तुका ह्मणे वाटे । चुकतां आडरानें कांटे ॥3॥ 828 आह्मां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥1॥ कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥ अविद्येचा येथें कोठें परिश्रम । रामकृष्णनाम ऐसे बाण ॥2॥ तुका ह्मणे येथें ख†याचा विकरा । न सरती येरा खोटएा परी ॥3॥ 829 दर्पणासी नखटें लाजे । शुद्ध खिजे देखोनि ॥1॥ ऐसें अवगुणांच्या बाधें । दिसे सुदें विपरीत ॥ध्रु.॥ अंधऑयास काय हिरा । गारां चि तो सारिखा ॥2॥ तुका ह्मणे भुंके सुनें । ठाया नेणे ठाव तो ॥3॥ 830 नावडे तरि कां येतील हे भांड । घेउनियां तोंड काळें येथें ॥1॥ नासोनियां जाय रस यासंगती । खळाचे पंगती नारायणा ॥ध्रु.॥ तोंडावाटा नर्क काढी अमंगळ । मिष्टान्ना विटाळ करी सुनें ॥2॥ तुका ह्मणे नाहीं संतांची मर्यादा । निंदे तो चि निंदा मायझवा ॥3॥ 831 लेकरा आइऩतें पित्याची जतन । दावी निजधन सर्व जोडी ॥1॥ त्यापरि आमचा जालासे सांभाळ । देखिला चि काळ नाहीं आड ॥ध्रु.॥ भुकेचे संनिध वसे स्तनपान । उपायाची भिन्न चिंता नाहीं ॥2॥ आळवूनि तुका उभा पैलथडी । घातली या उडी पांडुरंगें ॥3॥ 832 शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥1॥ सगुणाचे सोइऩ सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥ कीर्तनीं चि वोळे कृपेचा वोरस । दुरीपणें वास संनिधता ॥2॥ तुका ह्मणे वर्म सांगतों सवंगें । मन लावा लागें स्वहिताच्या ॥3॥ 833 जीवींचें जाणावें या नांवें आवडी । हेंकड तें ओढी अमंगळ ॥1॥ चित्ताच्या संकोचें कांहीं च न घडे । अतिशयें वेडे चार तो चि ॥ध्रु.॥ काळाविण कांहीं नाहीं रुचों येत । करूनि संकेत ठेवियेला ॥2॥ तुका ह्मणे कळे वचनें चांचणी । काय बोलवूनि वेळोवेळां ॥3॥ 834 कामातुर चवी सांडी । बरळ तोंडीं बरळे ॥1॥ रंगलें तें अंगीं दावी । विष देववी आसडे ॥ध्रु.॥ धनसोसें लागे वेड । ते बडबड शमेना ॥2॥ तुका ह्मणे वेसनें दोन्ही । नर्कखाणी भोगावया ॥3॥ 835 कृष्णांजनें जाले सोज्वळ लोचन । तेणें दिले वान निवडुनी ॥1॥ निरोपाच्या मापें करीं लडबड । त्याचें त्यानें गोड नारायणें ॥ध्रु.॥ भाग्यवंतांघरीं करितां विश्वासें । कार्य त्यासरिसें होइऩजेतें ॥2॥ तुका ह्मणे पोट भरे बरे वोजा । निज ठाव निजा निजस्थानीं ॥3॥ 836 मैंद आला पंढरीस । हातीं घेउनि प्रेमपाश ॥1॥ पुढें नाडियलें जग । नेतो लागों नेदी माग ॥ध्रु.॥ उभारोनि बाहे । दृष्टादृष्टी वेधीताहे ॥2॥ वैकंठीहुनि पेणें । केलें पंढरीकारणें ॥3॥ पुंडलिकें यारा । देउनि आणिलें चोरा ॥4॥ तुका ह्मणे चला । तुह्मी आह्मी धरूं त्याला ॥5॥ 837 भांडवी माउली कवतुकें बाळा । आपणा सकळां सािक्षत्वेसीं ॥1॥ माझी माझी ह्मणे एकएकां मारी । हें तों नाहीं दुरी उभयतां ॥ध्रु.॥ तुझें थोडें भातें माझें बहु फार । छंद करकर वाद मिथ्या ॥2॥ तुका ह्मणे एके ठायीं आहे वर्म । हें चि होय श्रम निवारितें ॥3॥ 838 लटिकियाच्या आशा । होतों पडिलों वळसा । होउनियां दोषा । पात्र मिथ्या अभिमानें ॥1॥ बरवी उघडली दृष्टी । नाहीं तरी होतों कष्टी । आक्रंदते सृष्टी । मात्र या चेष्टांनीं ॥ध्रु.॥ मरणाची नाहीं शुद्धी । लोभीं प्रवर्तली बुद्धी । परती तों कधीं । घडे चि ना माघारीं ॥2॥ सांचूनि मरे धन । लावी पोरांसी भांडण । नाहीं नारायण । तुका ह्मणे स्मरीला ॥3॥ 839 जवळी मुखापाशीं । असतां नेघे अहनिऩशीं ॥1॥ भवनिदाऩळण नाम । विठ्ठल विठ्ठल नासी काम ॥ध्रु.॥ सुखाचें शेजार । करूं कां नावडें घर ॥2॥ तुका ह्मणे ठेवा । कां हा न करी चि बरवा ॥3॥ 840 बरवें देशाउर जालें । काय बोलें बोलावें ॥1॥ लाभें लाभ दुणावला । जीव धाला दरुषणें ॥ध्रु.॥ भाग्यें जाली संतभेटी। आवडी पोटीं होती ते ॥2॥ तुका ह्मणे श्रम केला । अवघा आला फळासी ॥3॥ 841 सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥1॥ आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥ उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥2॥ तुका ह्मणे नुचलीं डोइऩ । ठेविली पायीं संतांचे ॥3॥ 842 आपुलाला लाहो करूं । केणें भरूं हा विठ्ठल ॥1॥ भाग्य पावलों या ठाया । आतां काया कुरवंडी ॥ध्रु.॥ पुढती कोठें घडे ऐसें । बहुतां दिसें फावलें ॥2॥ तुका ह्मणे जाली जोडी । चरण घडी न विसंभें ॥3॥ 843 उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥1॥ संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥ध्रु.॥ संपुष्ट हा हृदयपेटी । करूनि पोटीं सांटवूं ॥2॥ तुका ह्मणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥3॥ 844 आह्मां आपुलें नावडे संचित । चरफडी चित्त कळवऑयानें ॥1॥ न कळतां जाला खोळंब मारगा । जगीं जालों जगा बहुरूपी ॥ध्रु.॥ कळों आलें बरें उघडले डोळे । कर्णधार मिळे तरि बरें ॥2॥ तुका ह्मणे व्हाल ऐकत करुणा । तरि नारायणा उडी घाला ॥3॥ 845 बरगासाटीं खादलें शेण । मिळतां अन्न न संडी ॥1॥ फजित तो केला आहे । ताडण साहे गौरव ॥ध्रु.॥ ओढाळाची ओंगळ ओढी । उगी खोडी नवजाय ॥2॥ तुका फजीत करी बुच्या। विसरे कुच्या खोडी तेणें ॥3॥ 846 धांव घालीं आइऩ । आतां पाहातेसी काइऩ ॥1॥ धीर नाहीं माझे पोटीं । जालें वियोगें हिंपुटीं ॥ध्रु.॥ करावें सीतळ । बहु जाली हळहळ ॥2॥ तुका ह्मणे डोइऩ । कधीं ठेवीन हे पायीं ॥3॥ 847 तुह्मां ठावा होता देवा । माझें अंतरींचा हेवा ॥1॥ होती काशानें सुटका । तरि हे वैकुंठनायका ॥ध्रु.॥ नसतें सांभािळलें। जरि तुह्मीं आश्वासिलें ॥2॥ तुका ह्मणे कृपाळुवा । बरवा केला सावाधावा ॥3॥ 848 देऊं ते उपमा । आवडीनें पुरुषोत्तमा ॥1॥ पाहातां काशा तूं सारिखा । तिंहीं लोकांच्या जनका ॥ध्रु.॥ आरुष हे वाणी। गोड वरूनि घेतां कानीं ॥2॥ आवडीनें खेळे । तुका पुरवावे सोहाळे ॥3॥ 849 दर्शनाची आस । आतां ना साहे उदास ॥1॥ जीव आला पायांपाशीं । येथें असें कलिवरेंसीं ॥ध्रु.॥ कांहीं च नाठवे । ठायीं बैसलें नुठवे ॥2॥ जीव असतां पाहीं । तुका ठकावला ठायीं ॥3॥ 850 भोगावरि आह्मीं घातला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥1॥ विश्व तूं व्यापक काय मी निराळा । काशासाठीं बळा येऊं आतां ॥ध्रु.॥ काय सारूनियां काढावें बाहेरी । आणूनि भीतरी काय ठेवूं ॥2॥ केला तरी उरे वाद चि कोरडा । बळें घ्यावी पीडा स्वपनींची ॥3॥ आवघे चि वाण आले तुह्मां घरा । मजुरी मजुरा रोज कीदव ॥4॥ तुका ह्मणे कांहीं नेणें लाभ हानी । असेल तो धनी राखो वाडा ॥5॥ 851 कां हो एथें काळ आला आह्मां आड । तुह्मांपाशीं नाड करावया ॥1॥ कां हो विचाराचें पडिलें सांकडें । काय ऐसें कोडें उपजलें ॥ध्रु.॥ कां हो उपजेना द्यावी ऐशी भेटी । काय द्वैत पोटीं धरिलें देवा ॥2॥ पाप फार किंवा जालासी दुर्बळ । मागिल तें बळ नाहीं आतां ॥3॥ काय जालें देणें निघालें दिवाळें । कीं बांधलासि बळें ॠणेंपायीं ॥4॥ तुका ह्मणे कां रे ऐसी केली गोवी । तुझी माझी ठेवी निवडुनियां ॥5॥ 852 काय देह घालूं करवती करमरी । टाकुं या भितरी अग्नीमाजी ॥1॥ काय सेवूं वन शीत उष्ण तान । साहों कीं मोहन धरुनी बैसों ॥ध्रु.॥ काय लावूं अंगीं भस्म उधळण । हिंडूं देश कोण खुंट चारी ॥2॥ काय तजूं अन्न करूनि उपास । काय करूं नास जीवित्वाचा ॥3॥ तुका ह्मणे काय करावा उपाव । ऐसा देइप भाव पांडुरंगा ॥4॥ 853 दंभें कीतिऩ पोट भरे मानी जन । स्वहित कारण नव्हे कांहीं ॥1॥ अंतरती तुझे पाय मज दुरी । धरितां हे थोरी जाणिवेची ॥ध्रु.॥ पिंडाच्या पाळणें धांवती विकार । मज दावेदार मजमाजी ॥2॥ कैसा करूं घात आपुला आपण । धरूनि गुमान लोकलाज ॥3॥ तुका ह्मणे मज दावी तो सोहोळा । देखें पाय डोळां तुझे देवा ॥4॥ 854 धिग जिणें त्याचा स्वामी हीन वर । मरण तें बर भलें मग ॥1॥ ऐका जी देवा ऐसी आहे नीत । काय तें उचित सांभाळावें ॥ध्रु.॥ देशोदेशीं धाक जयाच्या उत्तरें । तयाचें कुतरें परि भलें ॥2॥ तुका ह्मणे हें कां सुचलें उत्तर । जाणोनि अंतर ओळखावें ॥3॥ 855 आतां गाऊं तुज ओविया मंगळीं । करूं गदारोळी हरिकथा ॥1॥ होसि निवारिता आमुचें सकळ । भय तळमळ पापपुण्य ॥ध्रु.॥ भोगिले ते भोग लावूं तुझे अंगीं । अलिप्त या जगीं होउनि राहों ॥2॥ तुका ह्मणे आह्मी लाडिकीं लेंकरें । न राहों अंतरे पायांविण ॥3॥ 856 सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥1॥ सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥2॥ तुका ह्मणे वाचा राहिली कुंटित । पुढें जालें चित्त समाधान ॥3॥ 857 विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥1॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥2॥ सकळां इंिद्रयां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥3॥ तुका ह्मणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥4॥ 858 होयें वारकरी । पांहे पांहे रे पंढरी ॥1॥ काय करावीं साधनें । फळ अवघें चि तेणें ॥ध्रु.॥ अभिमान नुरे । कोड अवघें चि पुरे ॥2॥ तुका ह्मणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥3॥ 859 पंढरीसी जाय । तो विसरे बापमाय ॥1॥ अवघा होय पांडुरंग । राहे धरूनियां अंग ॥ध्रु.॥ न लगे धन मान । देहभावें उदासीन ॥2॥ तुका ह्मणे मळ । नासी तात्काळ तें स्थळ ॥3॥ 860 बळें बाहएात्कारें संपादिलें सोंग । नाहीं जाला त्याग अंतरींचा ॥1॥ ऐसें येतें नित्य माझ्या अनुभवा । मनासी हा ठावा समाचार ॥ध्रु.॥ जागृतीचा नाहीं अनुभव स्वप्नीं । जातों विसरुनि सकळ हें ॥2॥ प्रपंचाबाहेरि नाहीं आलें चित्त । केले करी नित्य वेवसाय ॥3॥ तुका ह्मणे मज भोरप्या चि परी । जालें सोंग वरी आंत तैसें ॥4॥ 861 ह्मणवितों दास ते नाहीं करणी । आंत वरी दोन्ही भिन्न भाव ॥1॥ गातों नाचतों तें दाखवितों जना । प्रेम नारायणा नाहीं अंगीं ॥ध्रु.॥ पाविजे तें वर्म न कळे चि कांहीं । बुडालों या डोहीं दंभाचिया ॥2॥ भांडवल काळें हातोहातीं नेलें । माप या लागलें आयुष्यासी ॥3॥ तुका ह्मणे वांयां गेलों ऐसा दिसें । होइऩल या हांसें लौकिकाचें ॥4॥ 862 न कळतां काय करावा उपाय । जेणें राहे भाव तुझ्या पायीं ॥1॥ येऊनियां वास करिसी हृदयीं । ऐसें घडे कइप कासयानें ॥ध्रु.॥ साच भावें तुझें चिंतन मानसीं । राहे हें करिसी कैं गा देवा ॥2॥ लटिकें हें माझें करूनियां दुरी । साच तूं अंतरीं येउनि राहें ॥3॥ तुका ह्मणे मज राखावें पतिता ।आपुलिया सत्ता पांडुरंगा ॥4॥ 863 चिंतिलें तें मनिंचें जाणें । पुरवी खुणे अंतरींचें ॥1॥ रात्री न कळे दिवस न कळे । अंगीं खेळे दैवत हें ॥ध्रु.॥ नवसियाचे नव रस । भोगी त्यास भिन्न नाहीं ॥2॥ तुका ह्मणे सम चि देणें । समचरण उभा असे ॥3॥ 864 उधाराचा संदेह नाहीं । याचा कांहीं सेवकां ॥1॥ पांडुरंग अभिमानी । जीवदानी कोंवसा ॥ध्रु.॥ बुडतां जळीं जळतां अंगीं । ते प्रसंगीं राखावें ॥2॥ तुका ह्मणे आह्मांसाटीं । कृपा पोटीं वागवी ॥3॥ 865 काय विरिH कळे आह्मां । जाणों एका नामा विठोबाच्या ॥1॥ नाचों सुखें वैष्णवमेळीं । टाळघोळीं आनंदें ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया मी काय जाणें । गोविंद कीर्तनेंवांचूनियां ॥2॥ कासया उदास असों देहावरी । अमृतसागरीं बुडोनियां ॥3॥ कासया एकांत सेवूं तया वना । आनंद तो जनामाजी असे ॥4॥ तुका ह्मणे आह्मां ऐसा भरवसा । विठ्ठल सरसा चालतसे ॥5॥ 866 जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ॥1॥ दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ॥ध्रु.॥ गरुडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जेजेकारें ॥2॥ सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ॥3॥ तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ॥4॥ तुका ह्मणे भेणें । काळ नये तेणें राणें ॥5॥ 867 माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव । आपण चि देव होय गुरू ॥1॥ पढियें देहभावें पुरवितो वासना । अतीं तें आपणापाशीं न्यावें ॥ध्रु.॥ मागें पुढें उभा राहे सांभाळीत । आलिया आघात निवारावे ॥2॥ योगक्षेम जाणे जडभारी । वाट दावी करीं धरूनियां ॥3॥ तुका ह्मणे नाहीं विश्वास ज्या मनीं । पाहावें पुराणीं विचारूनी ॥4॥ 868 सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥1॥ काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥2॥ तुका ह्मणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥3॥ 869 उदंड शाहाणे होत तर्कवंत । परि या नेणवे अंत विठोबाचा ॥1॥ उदंडा अक्षरां करोत भरोवरी । परि ते नेणवे थोरी विठोबाची ॥2॥ तुका ह्मणे नाहीं भोळेपणाविण । जाणीव ते सिण रितें माप ॥3॥ 870 आधारावांचुनी । काय सांगसी काहाणी ॥1॥ ठावा नाहीं पंढरीराव । तोंवरी अवघें चि वाव ॥ध्रु.॥ मानिताहे कोण । तुझें कोरडें ब्रह्मYाान ॥2॥ तुका ह्मणे ठेवा । जाणपण एक सवा ॥3॥ 871 अनाथांची तुह्मां दया । पंढरीराया येतसे ॥1॥ ऐसी ऐकोनियां कीतिऩ । बहु विश्रांति पावलों ॥ध्रु.॥ अनाथांच्या धांवा घरा । नामें करा कुडावा ॥2॥ तुका ह्मणे सवघड हित । ठेवूं चित्त पायांपें ॥3॥ 872 येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥1॥ विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे मज ॥ध्रु.॥ वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तें चि माझें थीता त्याग ॥2॥ तुका ह्मणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥3॥ 873 हीं च त्यांचीं पंचभूतें । जीवन भातें प्रेमाचें ॥1॥ कळवळा धरिला संतीं । ते निगुती कैवाड ॥ध्रु.॥ हा च काळ वर्तमान । साधन ही संपत्ती ॥2॥ तुका ह्मणे दिवसरातीं । हें चि खाती अन्न ते ॥3॥ 874 दीप न देखे अंधारा । आतां हें चि करा जतन ॥1॥ नारायण नारायण । गांठी धन बळकट ॥ध्रु.॥ चिंतामणीपाशीं चिंता । तत्वता ही नयेल ॥2॥ तुका ह्मणे उभयलोकीं । हे चि निकी सामोग्री ॥3॥ 875 धन्य काळ संतभेटी । पायीं मिठी पडिली तो ॥1॥ संदेहाची सुटली गांठी । जालें पोटीं शीतळ ॥ध्रु.॥ भवनदीचा जाला तारा । या उत्तरा प्रसादें ॥2॥ तुका ह्मणे मंगळ आतां । कोण दाता याहूनि ॥3॥ 876 दिनरजनीं हा चि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥1॥ संकिल्पला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥ध्रु.॥ नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंिद्रयां ॥2॥ कीतिऩ मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥3॥ 877 खरें नानवट निक्षेपीचें जुनें । काढिलें ठेवणें समर्थाचें ॥1॥ मजुराच्या हातें मापाचा उकल । मी तों येथें फोल सत्ता त्याची ॥ध्रु.॥ कुलाळाच्या हातें घटाच्या उत्पित्त । पाठवी त्या जाती पाकस्थळा ॥2॥ तुका ह्मणे जीवन तें नारायणीं । प्रभा जाते कीणाअ प्रकाशाची ॥3॥ 878 गंगेचिया अंताविण काय चाड । आपुलें तें कोड तृषेपाशीं ॥1॥ विठ्ठल हे मूतिऩ साजिरी सुंदर । घालीं निरंतर हृदयपुटीं ॥ध्रु.॥ कारण तें असे नवनीतापाशीं । गबाळ तें सोसी इतर कोण ॥2॥ बाळाचे सोइऩतें घांस घाली माता । आटाहास चिंता नाहीं तया ॥3॥ गाऊं नाचों करूं आनंदसोहळा । भाव चि आगळा नाहीं हातां ॥4॥ तुका ह्मणे अवघें जालें एकमय । परलोकींची काय चाड आतां ॥5॥ 879 स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥1॥ आतां हाता धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥ येउनियां आड ठाके लोकलाज । तें हें दिसे काज अंतरलें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां जेथें जेथें गोवा । तेथें तुह्मीं देवा सांभाळावें ॥3॥ 880 पडिलों भोवणीं । होतों बहु चिंतवणी ॥1॥ होतों चुकलों मारग । लाहो केला लाग वेगें ॥ध्रु.॥ इंिद्रयांचे संदी । होतों सांपडलों बंदीं ॥2॥ तुका ह्मणे बरें जालें । विठ्ठलसें वाचे आलें ॥3॥ 881 बरें जालें आलीं ज्याचीं त्याच्या घरा । चुकला पा†हेरा ओढाळांचा ॥1॥ बहु केलें दुखी त्यांचिया सांभाळें । आतां तोंड काळें तेणें लोभें ॥ध्रु.॥ त्यांचिया अन्यायें भोगा माझें अंग । सकळ ही लाग द्यावा लागे ॥2॥ नाहीं कोठें िस्थर राहों दिलें क्षण । आजिवरी सिण पावलों तो ॥3॥ वेगळाल्या खोडी केली तडातडी। सांगावया घडी नाहीं सुख ॥4॥ निरवूनि तुका चालिला गोवारें । देवापाशीं भार सांडवूनि ॥5॥ 882 न करावी आतां पोटासाटीं चिंता । आहे त्या संचिता माप लावूं ॥1॥ दृिष्ट ते घालावी परमार्थाठायीं । क्षुल्लका उपायीं सिण जाला ॥ध्रु.॥ येथें तंव नाहीं घेइजेसें सवें । कांहीं नये जीवें वेचों मिथ्या ॥2॥ खंडणें चि नव्हे उद्वेग वेरझारीं । बापुडे संसारीं सदा असों ॥3॥ शेवटा पाववी नावेचें बैसनें । भुजाबळें कोणें कष्टी व्हावें ॥4॥ तुका ह्मणे आतां सकळांचें सार । करावा व्यापार तरी ऐसा ॥5॥ 883 आमच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥1॥ धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥ आणूनियां केला रूपा । उभा सोपा जवळी ॥2॥ तुका ह्मणे अंकित केला । खालीं आला वचनें ॥3॥ 884 खरें भांडवल सांपडलें गांठी । जेणें नये तुटी उदमासी ॥1॥ संवगाचें केणें सांपडलें घरीं । भरूनि वैखरी सांटविलें ॥ध्रु.॥ घेतां देतां लाभ होतसे सकळां । सदेवां दुर्बळा भाव तैसा ॥2॥ फडा आलिया तो न वजे निरासे । जरि कांहीं त्यास न कळतां ॥3॥ तुका ह्मणे आतां जालीसे नििंश्चती । आणीक तें चित्तीं न धरूं दुजें ॥4॥ 885 पदोपदीं दिलें अंग । जालें सांग कारण ॥1॥ रुधवूनि ठेलों ठाव । जगा वाव सकळ ॥ध्रु.॥ पुढती चाली मनालाहो । वाढे देहो संतोष ॥2॥ । तुका ह्मणे क्षरभागीं । जालों जगीं व्यापक ॥3॥ 886 निवडुनि दिलें नवनीत । संचित ते भोगीत ॥1॥ आतां पुढें भावसार । जीवना थार पाहावया ॥ध्रु.॥ पारखियाचे पडिलें हातीं । चांचपती आंधळीं ॥2॥ तुका ह्मणे सेवन घडे । त्यासी जोडे लाभ हा ॥3॥ 887 उचित न कळे इंिद्रयाचे ओढी । मुखें बडबडी शिकलें तें ॥1॥ आपण जाऊन न्यावीं नरकास । बळें बेताळीस कुळें जग ॥ध्रु.॥ अबोलणें बोले डोळे झांकुनियां । बडबडी वांयां दंभासाटीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मी तेथील पारखी । नाचे देखोवेखीं जाणों खरें ॥3॥ 888 एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येइऩ कैसें ॥1॥ ह्मणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥ आणिका संकल्पा नको गोऊं मन । तरी च कारण साध्य होय ॥2॥ तुका ह्मणे ऐसें जाणावें उचित । तरी सहज िस्थत येइऩल कळों ॥3॥ 889 गावे ह्मणउनि गीत । धरुनि राहे तैसें चित्त ॥1॥ हें चि थोर अवघड आहे । अन्न देखोनि भूक राहे ॥ध्रु.॥ ऐकावी ह्मूण कथा । राहे तैसें धरुनि चित्ता ॥2॥ तुका ह्मणे धणी । नव्हे जेविल्यावांचुनि ॥3॥ 890 कळल हे खुण । तरि दावी नारायण ॥1॥ सत्य संतांपाशीं राहे । येरां भय आड आहे ॥ध्रु.॥ अनुचिया ऐसें । असे भरलें प्रकाशें ॥2॥ इंिद्रयांचें धनी । ते हे जाती समजूनि ॥3॥ तर्क कुतर्क वाटा । नागवण घटापटा ॥4॥ तुका ह्मणे ल्यावें । डोळां अंजन बरवें ॥5॥ 891 जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥1॥ कैसा जालासे बेश्रम । लाज नाहीं न ह्मणे राम ॥ध्रु.॥ पाहे वैरियाकडे। डोळे वासुनियां रडे ॥2॥ बांधुनियां यमा हातीं । दिला नाहीं त्याची खंती ॥3॥ नाहीं यांपें काम । ऐसें जाणे तो अधम ॥4॥ अझुन तरि मुका । कां रे जालासि ह्मणे तुका ॥5॥ 892 वांटा घेइप लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक ॥1॥ ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥ नाहीं सारिलें तोंवरी । धांव घेइप वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥2॥ फट लंडी ह्मणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥3॥ 893 चालावा पंथ तो पाविजे त्या ठाया । ऐकिल्या वांयां वारता त्या ॥1॥ ऐका जी वोजे पडतसें पायां । भावाचि तें जायावाट नव्हे ॥ध्रु.॥ व्याली कुमारीचा अनुभवें अनुभव । सांगतां तो भाव येत नाहीं ॥2॥ तुका ह्मणे येथें पाहिजे आरालें । बिंबीं निवळलें तरि भासे ॥3॥ 894 काय नाहीं लवत झाडें । विसरे वेडें देहभाव ॥1॥ जया न फळे उपदेश । धस ऐसा त्या नांवें ॥ध्रु.॥ काय नाहीं असत जड । दगड तो अबोलणा ॥2॥ तुका ह्मणे कुचर दाणा । तैसा ह्मणा डेंग हा ॥3॥ 895 देखीचा दिमाख शिकोनियां दावी । हि†या ऐसी केवीं गारगोटी ॥1॥ मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मूतिऩ ॥ध्रु.॥ काय पडिलेंसी लटिक्याचे भरी । वोंवाळुनि थोरी परती सांडीं ॥2॥ तुका ह्मणे पुढें दिसतसे घात । करितों फजित ह्मणउनी ॥3॥ 896 संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥1॥ भHीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥ भिक्षाणी वेवसाव। काला करितो गाढव ॥2॥ करुनि वस्ती बाजारीं । ह्मणवी कासया निस्पृही ॥3॥ प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥4॥ तुका ह्मणे होंइऩ सुर । किंवा निसुर मजुर ॥5॥ 897 तेज्या इशारती । तटा फोक वरी घेती ॥1॥ काय सांगावें त्याहूनी । ऐका रे धरा मनीं ॥ध्रु.॥ नव्हे भांडखोर । ओढूनि धरूं पदर ॥2॥ तुका ह्मणे तोंड । काळें करा खालीं मुंड ॥3॥ 898 मागें संतीं होतें जें जें सांगितलें । तें येऊं लागलें अनुभवा ॥1॥ आचारभ्रष्ट होती लोक कळी । पुण्य क्षीण बळी जालें पाप ॥ध्रु.॥ वर्णधर्म कोण न धरी विटाळ । घालिती गोंधळ एके ठायीं ॥2॥ वेदाचे पाठक सेवितील मद्य । न देखती भेद विषयीं भांड ॥3॥ तुका ह्मणे किती करावे फजित । ते चि छंद नित्य बहु होती ॥4॥ 899 अक्षरांचा श्रम केला । फळा आला तेणें तो ॥1॥ अवघियाचा तळ धरी । जीवा उरी नुरउनी ॥ध्रु.॥ फळलें तें लवे भारें । पीक खरें आलें तइप ॥2॥ तुका ह्मणे देवा । पुढें भाव सारावा ॥3॥ 900 उचित जाणावें मुख्य धर्म आधीं । चित्तशुद्ध बुद्धी ठायीं िस्थर ॥1॥ न घलावी धांव मनाचिये ओढी । वचन आवडी संताचिये ॥2॥ अंतरीं या राहे वचनाचा विश्वास । न उगे उपदेश तुका ह्मणे ॥3॥ 6wvb37vc180a761wdjh83l3jejri4pl तुकाराम गाथा/ ९०१ ते १२०० 0 1536 36898 36889 2026-09-19T19:37:55Z QueerEcofeminist 1879 Restored revision 5051 by [[Special:Contributions/Rahuldeshmukh101|Rahuldeshmukh101]] ([[en:w:User:BrandonXLF/Restorer|Restorer]]) 36898 wikitext text/x-wiki 901 जीवन हे मुH नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥1॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥2॥ तुका ह्मणे जेणें आपलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥3॥ 902 द्रव्याचा तो आह्मी धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥1॥ करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥2॥ तुका ह्मणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥3॥ 903 द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । ह्मणोनियां संग खोटा त्याचा ॥1॥ निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥ आजिच्या प्रसंगें हा चि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥2॥ प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥3॥ तुका ह्मणे घेइप राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥4॥ 904 रडे अळंकार दैन्याचिये कांती । उतमा विपित्तसंग घडे ॥1॥ एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥2॥ तुका ह्मणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा ह्मणउनी ॥3॥ 905 दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥1॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥ भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥2॥ तुका ह्मणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥3॥ 906 सदैव तुह्मां अवघें आहे । हातपाय चालाया ॥1॥ मुखीं वाणी कानीं कीतिऩ । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥2॥ घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥3॥ तुका ह्मणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥4॥ 907 ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥1॥ म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥ संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥2॥ तुका ह्मणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥3॥ 908 सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥1॥ संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक ह्मणतां माझें कोणी ॥ध्रु.॥ देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥2॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥3॥ तुका ह्मणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥2॥ 909 आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥1॥ भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥ गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥2॥ तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥3॥ तुका ह्मणे गुण गाइप या देवाचे । घेइप माझे वाचे हे चि धणी ॥4॥ 910 आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥1॥ आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥2॥ माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥3॥ तुका ह्मणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥4॥ 911 धाइप अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥1॥ विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥ वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥2॥ अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥3॥ साधनाची सििद्ध । मोन करा िस्थर बुिद्ध ॥4॥ तुका ह्मणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥5॥ 912 कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥1॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥2॥ तुका ह्मणे लागे हातां । काय मथिलें घुसिळतां ॥3॥ 913 संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥1॥ विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥ करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥2॥ काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥3॥ तुका ह्मणे मज बोलवितो देव । अर्थ गुहए भाव तो चि जाणे ॥4॥ 914 चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥1॥ साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोटएां बाळां धाकुटियां ॥2॥ तुका ह्मणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥3॥ 915 तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलें चि देसी पद दासा ॥1॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥2॥ भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभHांची परी नावडेती ॥3॥ न वजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥4॥ तुका ह्मणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥5॥ 916 तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥1॥ वोळगती जया अष्टमासििद्ध । ते या जनबुद्धी नातळती ॥2॥ कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥3॥ लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥4॥ तुका ह्मणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥5॥ 917 कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥1॥ शास्त्रYा पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥2॥ कलियुगीं बहु कुशळ हे जन । छिळतील गुण तुझे गातां ॥3॥ मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥4॥ तुका ह्मणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥5॥ 918 काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥1॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥2॥ तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥3॥ तुका ह्मणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥4॥ 919 काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥1॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥ अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥2॥ तुका ह्मणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥3॥ 920 काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥1॥ होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥ नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥2॥ तुका ह्मणे माझें । काय होइऩल तुह्मां ओझें ॥3॥ 921 एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥1॥ आह्मी देवा शिHहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥ पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥2॥ तुका ह्मणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥3॥ 922 पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥1॥ संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥ ज्येष्ठांचीं कां आह्मां जोडी। परवडी न लभों ॥2॥ तुका ह्मणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥3॥ 923 कैवल्याच्या तुह्मां घरीं । रासी हरी उदंड ॥1॥ मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥ सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥3॥ 924 आपलाल्या तुह्मी रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥1॥ हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥ बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥2॥ तुका ह्मणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥3॥ 925 न मनावी चिंता तुह्मीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥1॥ पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥ बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥3॥ 926 यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥1॥ आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥ मंगळ तें तुह्मी जाणां । नारायणा काय तें ॥2॥ तुका ह्मणे समपिऩला । तुज विठ्ठला देहभाव ॥3॥ 927 भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥1॥ चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥ माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥2॥ तुका ह्मणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥3॥ 928 पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोिळयांची भूक न वजे माझी ॥1॥ जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥ श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥2॥ महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥3॥ तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥4॥ 929 हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥1॥ बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥ जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥2॥ तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥3॥ तुका ह्मणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥4॥ 930 आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥1॥ प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृिष्ट हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥ भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥2॥ आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आह्मां करीं खेळावया ॥3॥ तुका ह्मणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥4॥ 931 जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥1॥ पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥ भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥2॥ तुका ह्मणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥3॥ 932 आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥1॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥ जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥2॥ तुका ह्मणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥3॥ 933 जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥1॥ विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥ वदऩळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥2॥ तुका ह्मणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥3॥ 934 एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥1॥ होय भHीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥ एवढा जगदानी। मागे तुळसीदळ पाणी ॥2॥ आला नांवा रूपा । तुका ह्मणे जाला सोपा ॥3॥ 935 भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥1॥ विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥ अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥2॥ तुका ह्मणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥3॥ 936 पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आह्मां नारायण तैशापरी ॥1॥ सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आह्मां नारायण तैशापरी ॥2॥ तुका ह्मणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥3॥ 937 विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥1॥ अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥ तो चि शरणागतां हा विठ्ठल मुिHदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥2॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सििद्ध। लागली समाधि विठ्ठलनामें ॥3॥ विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख। गोडावलें मुख तुका ह्मणे ॥4॥ 938 विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥1॥ लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥ एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥2॥ बांधा माझिया जीवासी । तुका ह्मणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥3॥ 939 वाट वैकुंठीं पाहाती । भH कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥1॥ धन्यधन्य हरिचे दास। तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥ कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस। वाट कर जोडोनियां ॥2॥ रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरिभHां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भHांची ॥3॥ असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥4॥ सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका ह्मणे दरुषणें ॥5॥ 940 सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥1॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥ क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥2॥ तुका ह्मणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावइऩल ॥3॥ 941 फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥1॥ आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥ भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥2॥ तुका ह्मणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥3॥ 942 उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आह्मां चाड ॥1॥ बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा ह्मणउनि ॥2॥ तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येइऩल कळों ॥3॥ 943 आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥1॥ होइप बा जागा होइप वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥ जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥2॥ तुका ह्मणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥3॥ 944 माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥1॥ फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥ नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥2॥ तुका ह्मणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥3॥ 945 चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काइऩ । स्वहित तें ठायीं आपणापें ॥1॥ मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥2॥ भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥3॥ तुका ह्मणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होइऩल त्यांचा ॥4॥ 946 नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥1॥ कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥2॥ ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका ह्मणे ॥3॥ 947 वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥1॥ या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥ सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥2॥ तुका ह्मणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥3॥ 948 चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥1॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥ करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥2॥ तुका ह्मणे मोह परते चि ना मागें । ह्मणउनि त्यागें त्याग जाला ॥3॥ 949 निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥1॥ तुह्मां आह्मां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥ आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर ह्मणउनि ॥2॥ तुका ह्मणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुह्मां ऐसी ॥3॥ 950 तुज च पासाव जालोंसों निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥1॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । नुन्य कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं आYोचें पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥2॥ तुका ह्मणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुह्माऐसा ॥3॥ 951 प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भिHरस सांगा कां जी तुह्मीं ॥1॥ ह्मणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥ न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥2॥ तुका ह्मणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खविळलें ॥3॥ 952 लटिका ऐसा ह्मणतां देव । संदेहसा वाटतसे ॥1॥ ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥2॥ तुका ह्मणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥3॥ 953 जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥1॥ उदास तूं नारायणा । मी ही ह्मणा तुह्मी च ॥ध्रु.॥ ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥2॥ एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥3॥ 954 बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥1॥ आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥ तुह्मां आह्मां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥2॥ तुका ह्मणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥3॥ 955 आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥1॥ मढएापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥2॥ तुका ह्मणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥3॥ 956 मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥1॥ लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥2॥ तुका ह्मणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥3॥ 957 पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥1॥ घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥ न घडतां दृष्टादृष्टी। काय गोष्टी कोरडएा ॥2॥ अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥3॥ 958 अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥1॥ तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥2॥ तुका ह्मणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥3॥ 959 संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥1॥ आतां नको मज खोटएानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥ गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥2॥ तुका ह्मणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥3॥ 960 वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥1॥ आह्मी ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥ वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥2॥ तुका ह्मणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥3॥ 961 उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साट होती ॥1॥ काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सवाौत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥ नानाछंदें आह्मां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥3॥ 962 आह्मी बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुह्मां गोऊं ॥1॥ जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥ तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥3॥ 963 तुह्मी साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥1॥ कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥ सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी सभाग्य जी देवा । माझा तुह्मां केवा काय आला ॥3॥ 964 तुह्मां होइऩल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥1॥ पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥ आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥2॥ तुका ह्मणे देह देइऩन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥3॥ 965 जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥1॥ ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥ गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तइप । अवकळा केलिया ॥2॥ तुका ह्मणे ठावे । तुह्मी असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥3॥ 966 आह्मी शिHहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥1॥ माझें मज देइप देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥ नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥2॥ नाहीं येत बळा । आतां तुह्मासी द्मगोपाळा । तुका ह्मणे गळा । उगवा पायां लागतों ॥3॥ 967 काय कृपेविण घालावें सांकडें । नििंश्चती निवाडें कोण्या एका ॥1॥ आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥ धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥2॥ तुका ह्मणे आह्मी भावहीन जीव । ह्मणउनी देव दुरे दुरी ॥3॥ 968 नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥1॥ अशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान नििंश्चतीचें ॥ध्रु.॥ दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां लाज येत नाहीं । आह्मां चिंताडोहीं बुडवितां ॥3॥ 969 जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥1॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥ क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥2॥ तुका ह्मणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥3॥ 970 ह्मणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥1॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥ कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥2॥ तुका ह्मणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥3॥ 971 काय आतां आह्मीं पोट चि भरावें । जग चाळवावें भH ह्मुण ॥1॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥ काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥2॥ तुका ह्मणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥3॥ 972 वर्म तरि आह्मां दावा । काय देवा जाणें मी ॥1॥ बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥ द्याल जरि तुह्मी धीर । होइऩल िस्थर मन ठायीं ॥2॥ तुका ह्मणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥3॥ 973 सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥1॥ वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥ आवडीच्या करा ऐसें। अंतर्वासें जाणतसां ॥2॥ तुका ह्मणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥3॥ 974 निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥1॥ बैसलिया भाव पांयीं । बरा तइप नाचेन ॥ध्रु.॥ स्वामी कळे सावधान। तरि मन उल्हासे ॥2॥ तुका ह्मणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥3॥ 975 जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥1॥ नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥ पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥2॥ आतां ह्मणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥3॥ 976 आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥1॥ तुह्मांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥ सेवेच्या अभिळासें। मन बहु जालें पिसें ॥2॥ अरे भHापराधीना । तुका ह्मणे नारायणा ॥3॥ 977 तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥1॥ कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥ कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥2॥ तुका ह्मणे आतां । न सरे हवाले घालितां ॥3॥ 978 माझी भHी भोळी । एकविध भावबळी ॥1॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥ आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥2॥ तुका ह्मणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥3॥ 979 आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥1॥ अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥ तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥2॥ तुका ह्मणे रुची । येथें भिन्नता कैची ॥3॥ 980 काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥1॥ युH आहार वेहार । नेम इंिद्रयांचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥2॥ देह समपिऩजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होइऩल आघवा। तुका ह्मणे आनंद ॥3॥ 981 मऊ मेनाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥1॥ मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥ भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठएाळा चि गांठीं देऊं माथां ॥2॥ मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥3॥ अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥4॥ तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥5॥ 982 गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥1॥ तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥ उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥2॥ तुका ह्मणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥3॥ 983 विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥1॥ गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुिद्ध करुनी ठेवा ॥ध्रु.॥ विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥2॥ तुका ह्मणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥3॥ 984 कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥1॥ उदंड त्या गाइऩ ह्मैसी आणि शेऑया । परि त्या निराऑया कामधेनु ॥2॥ तुका ह्मणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥3॥ 985 जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥1॥ सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥ मैंद मुखींचा कोंवळा। भाव अंतरीं निराळा ॥2॥ जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥3॥ बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥4॥ तुका ह्मणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥5॥ 986 वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥1॥ कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥ सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥2॥ याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥3॥ तुका ह्मणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥4॥ 987 अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥1॥ गिळुनि सांडिलें किळवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥2॥ तुका ह्मणे आतां । उरलों उपकारापुरता ॥3॥ 988 धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥1॥ जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥ जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥2॥ तुका ह्मणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥3॥ 989 हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥1॥ येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥ सांभािळलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥2॥ जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥3॥ 990 फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥1॥ स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ‍ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥ निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥2॥ योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥3॥ तुका ह्मणे मना पाहें विचारून । होइप रे कठिण वज्राऐसें ॥4॥ 991 जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडे हे विधि । निषेधीं चि चांगली ॥1॥ तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥ जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोHा निराळा । तेणें गोडी निवडिली ॥2॥ हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥3॥ उष्णें छाये सुख वाटे। बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥4॥ तुका ह्मणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुH । ऐसा जाला भरवसा ॥5॥ 992 मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥1॥ जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥ भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥2॥ तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥3॥ 993 नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होइऩल त्या साहे पांडुरंग ॥1॥ पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥ नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥2॥ तुका ह्मणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥3॥ 994 कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥1॥ साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाइऩन तें ॥ध्रु.॥ न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥2॥ तुका ह्मणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभािळता ॥3॥ 995 चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता काुंफ्ज अंगीं ॥1॥ आतां पुढें वांयां जावें हें तें काइऩ । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥ गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुिद्ध ॥2॥ तुका हमणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥3॥ 996 धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥1॥ येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥ लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥2॥ मधुरा वाणी ओटीं । तुका ह्मणे वाव पोटीं ॥3॥ 997 कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥1॥ राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥ तरटापुढें बरें नाचे। सुतकाचें मुसळ ॥2॥ तुका ह्मणे काठी सार । करी फार शाहाणें ॥3॥ 998 कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥1॥ जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥ आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥2॥ तुका ह्मणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥3॥ 999 मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥1॥ लIमी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥ नमन नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥3॥ 1000 शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥1॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुह्मांसी ॥ध्रु.॥ पुढें फार बोलों काइऩ । अवघें पायीं विदित ॥2॥ तुका ह्मणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥3॥ 1001 करितों कवित्व ह्मणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1॥ माझिये युHीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥ निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥ तुका ह्मणे आहें पाइऩक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4॥ 1002 आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न ह्मणावें । ऐसें तंव आह्मां सांगितलें नाहीं देवें ॥1॥ ह्मणा रामराम टाळी वाजवा हातें। नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥ सहज घडे तया आळस करणें तें काइऩ । अग्नीचें भातुकें हात पािळतां कां पायीं ॥2॥ येथें नाहीं लाज भिHभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रह्महत्यापातक ॥3॥ जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥4॥ सदैव ज्यां कथा काळ घडे श्रवण । तुका ह्मणे येर जन्मा आले पाषाण ॥5॥ 1003 देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥1॥ देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥ देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥2॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥3॥ दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥4॥ 1004 विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥1॥ साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥ भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥2॥ तुका ह्मणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥3॥ 1005 कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥1॥ कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देइऩल ॥ध्रु.॥ वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥2॥ उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥3॥ 1006 कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥1॥ अवघें आलें आंत पोटा पडिलें थीतें । सारूनि नििंश्चत जालों देवा ॥ध्रु.॥ द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥2॥ तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥3॥ तुका ह्मणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेइप देवा ॥4॥ 1007 करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥1॥ देसी कीं न देसी पायांचें दर्शन । ह्मणऊनि मन िस्थर नाहीं ॥ध्रु.॥ बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । ह्मणोनियां जीवा भय वाटे ॥2॥ होइऩल कीं न होय तुज माझा आठव। पडिला संदेह हा चि मज ॥3॥ तुका ह्मणे मी कमाइऩचे हीण। ह्मणऊनि सीण करीं देवा ॥4॥ 1008 ऐसा माझा आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥1॥ काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥ काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥2॥ कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥3॥ तुका ह्मणे वांयां जालों भूमी भार । होइऩल विचार काय नेणों ॥4॥ 1009 साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥1॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥ शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देइप निवडूनि ॥2॥ उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥4॥ 1010 नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥1॥ जन वन आह्मां समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥ षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥2॥ ह्मणऊनिं मुख्य धर्म आह्मां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥3॥ ह्मणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥4॥ 1011 वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥1॥ नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥ शब्दYाानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥2॥ जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥3॥ तुका ह्मणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥4॥ 1012 न कळे तkवYाान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥1॥ आगमाचे भेद मी काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ध्रु.॥ कांहीं नेणें परि ह्मणवितों दास । होइल त्याचा त्यास अभिमान ॥2॥ संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥3॥ मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥4॥ तुका ह्मणे अगा रखुमादेवीवरा । भHकरुणाकरा सांभाळावें ॥5॥ 1013 इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥1॥ इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥ इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥2॥ इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥3॥ भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका ह्मणे आतां शरण आलों ॥4॥ 1014 तुझा दास ऐसा ह्मणती लोकपाळ । ह्मणऊनि सांभाळ करीं माझा ॥1॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥ माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥2॥ नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥3॥ तुका ह्मणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥4॥ 1015 जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥1॥ करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥ बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥2॥ जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥3॥ तुका ह्मणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥4॥ 1016 नको ब्रह्मYाान आत्मिस्थतिभाव । मी भH तूं देव ऐसें करीं ॥1॥ दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥ पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥2॥ पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥3॥ तुका ह्मणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥4॥ 1017 मागें शरणागत तारिले बहुत । ह्मणती दीनानाथ तुज देवा ॥1॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥ अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥2॥ गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥3॥ प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥4॥ पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥5॥ तुका ह्मणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥6॥ 1018 तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥1॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनियां मात विश्वासलों ॥2॥ न करावी निरास न धरावें उदास । देइप याचकास कृपादान ॥3॥ तुका ह्मणे मी तों पातकांची रासी । देइप पायापासीं ठाव देवा ॥4॥ 1019 सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अिग्न जैसा ॥1॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥ घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मिस्थति तया अंगीं वसे ॥2॥ नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वताौनि तो जनीं जनादऩन ॥3॥ तुका ह्मणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥4॥ 1020 कुळधर्म Yाान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हातीं चढे ॥1॥ कुळधर्म भिH कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥ कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥2॥ कुळधर्म महkव कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥3॥ तुका ह्मणे कुळधर्म दावी देवीं देव । यथाविध भाव जरीं होय ॥4॥ 1021 पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥1॥ सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥ गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥2॥ संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥3॥ तुका ह्मणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥4॥ 1022 न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥1॥ न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥ न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥2॥ न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥3॥ तुका ह्मणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥4॥ 1023 चित्तीं धरीन मी पाउलें सकुमारें । सकळ बिढार संपत्तीचें ॥1॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होइऩल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥ पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥2॥ करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥3॥ तुका ह्मणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥4॥ 1024 बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥1॥ तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥ कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥2॥ सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥3॥ जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥4॥ तुका ह्मणे तुह्मी तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥5॥ 1025 जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥1॥ न संपडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥ मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥2॥ सांगावे ते किती तुह्मांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥3॥ ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥4॥ तुका ह्मणे तूं हें जाणसी सकळ । यावरि कृपाळ होइप देवा ॥5॥ 1026 शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विYाापना ॥1॥ अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विYाापना ॥ध्रु.॥ गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥2॥ भागलियाचा होइप रे विसांवा । परिसावी केशवा विYाापना ॥3॥ अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विYाापना ॥4॥ तुका ह्मणे आह्मां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विYाापना ॥5॥ 1027 कोण आह्मां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥1॥ कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥2॥ कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥3॥ कोणावरी आह्मीं करावी हे सत्ता । होइल साहाता कोण दुजा ॥4॥ तुका ह्मणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥5॥ 1028 तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आह्मां मुिHपांग काइऩ ॥1॥ धांवा केला आतां होइऩल धांवणे । तया कायी करणें लागे सध्या ॥ध्रु.॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ। आनंदें सकळ भरी आलें ॥2॥ देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥3॥ तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात। प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥4॥ तुका ह्मणे आह्मीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥5॥ 1029 तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शिHहीन ॥1॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥ तरि च ह्मणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुण ॥2॥ चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा ह्मणऊनि ॥3॥ तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥4॥ तुका ह्मणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥5॥ 1030 अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥1॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥2॥ सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥3॥ निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥4॥ तुका ह्मणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥5॥ 1031 संसारसोहळे भोगितां सकळ । भHां त्याचें बळ विटोबाचें ॥1॥ भय चिंता धाक न मनिती मनीं । भHां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥ पापपुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भHांसी श्रीरंग सर्वभावे ॥2॥ नव्हती ते मुH आवडे संसार । देव भHां भार सर्व वाहे ॥3॥ तुका ह्मणे देव भHां वेळाइऩत । भH ते नििंश्चत त्याचियानें ॥4॥ 1032 देवासी अवतार भHांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥1॥ भHांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥ देवें भHां रूप दिलासे आकार । भHीं त्याचा पार वाखाणिला ॥2॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभHपण स्वामिसेवा ॥3॥ तुका ह्मणे येथें नाहीं भिन्नभाव । भH तो चि देव देव भH ॥4॥ 1033 हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥1॥ गोपाळांची पूजा उिच्छष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥ चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥2॥ निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥3॥ जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥4॥ तुका ह्मणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥5॥ 1034 समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥1॥ आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥ न ह्मणे सोइरा सुहुदऩ आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥3॥ भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥3॥ कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥4॥ तुका ह्मणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥5॥ 1035 आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥1॥ उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥ वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥2॥ तुका ह्मणे माप । खरें आणा माझे बाप ॥3॥ 1036 लIमीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥1॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥ माझी अल्प हे वासना। तूं तो उदाराचा राणा ॥2॥ तुका ह्मणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥3॥ 1037 करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥1॥ प्रेम झोंबो कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥ राहे लोकाचार पडे अवघा विसर ॥2॥ तुका ह्मणे ध्यावें । तुज विभीचारभावें ॥3॥ 1038 टाळ दिडी हातीं । वैकुंठींचे सांगाती ॥1॥ जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥ जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥2॥ तुका ह्मणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥3॥ 1039 वांयां जातों देवा । नेणें भHी करूं सेवा ॥1॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥ करावें तें काय। न कळें अवलोकितों पाय ॥2॥ तुका ह्मणे दान । दिलें पदरीं घेइऩन ॥3॥ 1040 जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥1॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुह्मां आह्मां सय । विघडाविघड केली ॥ध्रु.॥ बोलतां दुिश्चती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये ह्मणतां मी माझें ॥2॥ भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥3॥ नका बोलों सये । मज वचन न साहे। बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥4॥ तुह्मां आह्मां भेटी । नाहीं जाली जीवेंसाटीं । तुका ह्मणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥5॥ 1041 जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥1॥ आह्मां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥ पुंडलिकाचे पाठीं। उभा हात ठेवुनि कटी ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं । वाहूं रखुमाइऩचा पती ॥3॥ 1042 माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥1॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥ दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥2॥ तुका ह्मणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥3॥ 1043 आतां आह्मां हें चि काम । न विसंभावें तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें नाचावें ॥1॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥ गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥2॥ तुका ह्मणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥3॥ 1044 चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥1॥ ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥2॥ तुका ह्मणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥3॥ 1045 मुनि मुH जाले भेणें गर्भवासा । आह्मां विष्णुदासां सुलभ तो ॥1॥ अवघा चि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप ह्मणोनियां ॥ध्रु.॥ पुराणीं उपदेश साधन उद्भट । आह्मां सोपी वाट वैकुंठींची ॥2॥ तुका ह्मणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥2॥ 1046 न करावी स्तुति माझी संतजनीं । होइऩल या वचनीं अभिमान ॥1॥ भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥2॥ तुका ह्मणे गर्व पुरवील पाठी । होइऩल माझ्या तुटी विठोबाची ॥3॥ 1047 तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥1॥ नवविधा काय बोलिली जे भHी । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥2॥ तुका ह्मणे तुमच्या पायांच्या आधारें। उत्तरेन खरें भवनदी ॥3॥ 1048 चोर टेंकाचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥1॥ नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥ बुिद्धहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥2॥ तुका ह्मणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥3॥ 1049 समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥1॥ अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥2॥ तुका ह्मणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥3॥ 1050 गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राख तया तेणें केलीसे भेटी ॥1॥ सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥ माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥2॥ तुका ह्मणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥3॥ 1051 नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥1॥ शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥2॥ वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका ह्मणे ॥3॥ 1052 जन मानविलें वरी बाहएात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥1॥ ह्मणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥ संतां ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥2॥ तुका ह्मणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥3॥ 1053 काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥1॥ कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥ पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥2॥ तुका ह्मणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥3॥ 1054 स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥1॥ तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥ रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥2॥ तुका ह्मणे तुमचें सेवितों उिच्छष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥3॥ 1055 बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥1॥ आतां उतरला भार । तुह्मीं केला अंगीकार ॥ध्रु.॥ बहु काकुलती । आलों मागें किती ॥2॥ तुका ह्मणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥3॥ पाइऩक - अभंग 11 1056 पाइऩकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥1॥ पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥ तरि व्हावें पाइऩक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥2॥ पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥3॥ तुका ह्मणे एका क्षणांचा करार । पाइऩक अपार सुख भोगी ॥4॥ 1057 पाइकीचें सुख पाइकासी ठावें । ह्मणोनियां जीवें केली साटीं ॥1॥ येतां गोऑया बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृिष्ट वरी ॥ध्रु.॥ स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥2॥ पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥3॥ तुका ह्मणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥4॥ 1058 पाइऩक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥1॥ आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥ येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाइऩक त्या जग स्वामी मानी ॥2॥ ऐसें जन केलें पाइकें पाइऩक । जया कोणी भीक न घलिती ॥3॥ तुका ह्मणे ऐसे जयाचे पाइऩक । बिळया तो नाइक त्रैलोकींचा ॥4॥ 1059 पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥1॥ पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥ आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥2॥ सांडितां मारग मारिती पाइऩक । आणिकांसी शीक लागावया ॥3॥ तुका ह्मणे विश्वा घेऊनि विश्वास । पाइऩक तयास सुख देती ॥4॥ 1060 पाइऩक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥1॥ तो एक पाइऩक पाइकां नाइऩक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥2॥ विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥3॥ तुका ह्मणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥4॥ 1061 धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥1॥ जिवाचे उदार शोभती पाइऩक । मिरवती नाइऩक मुगुटमणि ॥ध्रु.॥ आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥2॥ कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥3॥ तुका ह्मणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥4॥ 1062 पाइकपणें खरा मुशारा । पाइऩक तो खरा पाइकीनें ॥1॥ पाइऩक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥ एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाइऩक तो पणें निवडला ॥2॥ करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥3॥ तुका ह्मणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥4॥ 1063 उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥1॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥ प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाइऩक तो नांव मिरवी वांयां ॥2॥ गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥3॥ तुका ह्मणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाइऩक पाहोन मोल करी ॥4॥ 1064 एका च स्वामीचे पाइऩक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥1॥ स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥ हीन कमाइऩचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥2॥ पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढएा ठाव ॥3॥ तुका ह्मणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥4॥ 1065 प्रजी तो पाइऩक ओळीचा नाइऩक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥1॥ आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥ पाठीवरी घाय ह्मणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥2॥ घेइऩल दरवडा देहा तो पाइऩक । मारी सकळीक सर्व हरी ॥3॥ तुका ह्मणे नव्हे बोलाचें कारण । कमाइऩचा पण सिद्धी पावे ॥4॥ 1066 जातीचा पाइऩक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥1॥ धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥ जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥2॥ तुका ह्मणे नमूं देव ह्मुण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥3॥ ॥11॥ 1067 बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥1॥ आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥ अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥2॥ यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥3॥ तुका ह्मणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥4॥ 1068 आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुह्मां लागे कोडें उगवणें ॥1॥ आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुह्मां हातीं ॥ध्रु.॥ न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥2॥ दयासिंधु नाम पतितपावन । हें आह्मां वचन सांपडलें ॥3॥ तुका ह्मणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूं चि देवा ॥4॥ 1069 जो भHांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥1॥ हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें । भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥ध्रु.॥ थोर भHांची आस । पाहे भोंवताली वास ॥2॥ तुका ह्मणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥3॥ 1070 अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नानीं कांटाळा ॥1॥ पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण विठोबा ॥ध्रु.॥ तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥2॥ तुका ह्मणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥3॥ 1071 पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥1॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥2॥ तुका ह्मणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥3॥ 1072 जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥1॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥2॥ तुका ह्मणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥3॥ 1073 भH भागवत जीवन्मुH संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं। ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥1॥ ब्रह्मानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनीं ॥ध्रु.॥ शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भHराया देखियेली । देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रह्मार्पण ॥2॥ संत ग्रहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका । संत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥3॥ शांति पतिव्रते जाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता। क्षमा क्षमापणें प्रसिद्ध प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूतिऩमंत ॥4॥ दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीतिऩ तुझी । वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूतें ॥5॥ अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभिH। ब्रह्म ऐक्यभावें भिH विस्तारिली । वाक्यें सपळ केलीं वेदविहितें ॥6॥ देहबुिद्ध जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेिक्षलों न पाहिजे। न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥7॥ 1074 भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥1॥ आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥ जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥2॥ तुका ह्मणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रििद्धसिद्धी ॥3॥ ॥घोंगडएाचे अभंग-॥12॥ 1075 ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥1॥ पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥2 ॥ तुका ह्मणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥3॥ 1076 घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥1॥ कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥ तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥2॥ तुका ह्मणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥3॥ 1077 खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥1॥ कान्होबाचे पडिलों गळां । घेइप गोपाळा देइप झाडा ॥ध्रु.॥ मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥2॥ तुका ह्मणे बुिद्ध काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥3॥ 1078 घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥1॥ माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥ व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥2॥ तुका ह्मणे लाहाण मोठा । सांड ताठा हा देवा ॥3॥ 1079 नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥1॥ चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥ तुह्मां आह्मां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥2॥ तुका ह्मणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥3॥ 1080 तुह्मां आह्मां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥1॥ माझें घोंगडें टाकुन देइप । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥ विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥2॥ तुका ह्मणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥3॥ 1081 मुळींचा तुह्मां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥1॥ घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥2॥ तुका ह्मणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥3॥ 1082 घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥1॥ हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥ नोळखवे म्यां धरिला हातीं । देहएादिप माय लाविली वाती ॥2॥ न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥3॥ 1083 आतां मी देवा पांघरों काइऩ । भिकेचें तें ही उरे चि ना ॥1॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥ नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥2॥ तुका ह्मणे जना वेगळें जालें । एक चि नेलें एकल्याचें ॥3॥ 1084 मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥1॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥ घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥2॥ तुका ह्मणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥3॥ 1085 घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥1॥ पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥ सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥2॥ घोंगडियाचा करा बोभाट । तुका ह्मणे जंव भरला हाट ॥3॥ 1086 माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥1॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥ चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥2॥ आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥3॥ आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥4॥ तुका ह्मणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥5॥ ॥12॥ 1087 सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥1॥ तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां । माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥ आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥2॥ पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥3॥ गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥4॥ 1088 यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥1॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥2॥ तुका ह्मणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥3॥ 1089 शीतळ साउली आमुची माउली । विठाइऩ वोळली प्रेमपान्हा ॥1॥ जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥ कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥2॥ आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥3॥ सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥4॥ तुका ह्मणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाइऩचें ॥5॥ रामचरित्र - अभंग ॥14॥ 1090 रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥1॥ केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥ वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥2॥ तुका ह्मणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥3॥ 1091 राम ह्मणे ग्रासोग्रासीं । तो चि जेविला उपवासी ॥1॥ धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥ राम ह्मणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥2॥ राम ह्मणे वाटे चाली । यYा पाउलापाउलीं ॥3॥ राम ह्मणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥4॥ ऐसा राम जपे नित्य । तुका ह्मणे जीवन्मुH ॥5॥ 1092 तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥1॥ तो हा न करी तें काइऩ । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥ सीळा मनुष्य जाली। ज्याच्या चरणाचे चाली ॥2॥ वानरां हातीं लंका । घेवविली ह्मणे तुका ॥3॥ 1093 राम ह्मणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥1॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥2॥ तुका ह्मणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥3॥ 1094 रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥1॥ कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥ हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥2॥ जुन्हाट नागर नीच नवें । तुका ह्मणें म्यां धरिलें जीवें भावें ॥3॥ 1095 राम ह्मणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥1॥ राम ह्मणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥ राम ह्मणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत ह्मणतां राम ॥2॥ राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥3॥ तुका ह्मणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥4॥ 1096 पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥1॥ अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥ अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होइऩ शरणागत किंवा युद्धासी सादर ॥2॥ तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेइऩ आतां संवंघेसी तुटी ॥3॥ 1097 समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥1॥ कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥2॥ तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥3॥ 1098 केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥1॥ लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥ उदार्याची सीमा । काय वणूप रघुरामा ॥2॥ तुका ह्मणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥3॥ 1099 रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥1॥ राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी । राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥ अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥2॥ स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥3॥ रावणेसी लंका। राम आपण जाला देखा ॥4॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥5॥ 1100 आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥1॥ आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जेजेकार आळंगिला भरत ॥ध्रु.॥ करिती अक्षवाणें ओंवािळती रघुवीरा । लIमीसहित लIमण दुसरा ॥2॥ जालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका ह्मणे गाइऩवत्सें नरनारीबाळें ॥3॥ 1101 जालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाइऩ वोळल्या ह्मैसी ॥1॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये। दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥ स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥2॥ तुका ह्मणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥3॥ 1102 अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥1॥ रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥ कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवाणी ॥2॥ तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥3॥ नाम जपें बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥4॥ नामजप जीवन मुनिजना ॥ तुकयास्वामी रघुनंदना ॥5॥ 1103 मी तों अल्प मतिहीन । काय वणूप तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥1॥ नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुH केलें राक्षसां ॥ध्रु.॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥2॥ शिळा होती मनुष्य जाली । थोर कीतिऩ वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥3॥ राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥4॥ ॥14॥ श्लोकरूपी अभंग - ॥6॥ 1104 तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥1॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका । मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥2॥ हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥3॥ भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी । असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काइप ॥4॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पायिं तो राख देव। असें मागतसे तुझी चरणसेवा ॥5॥ 1105 उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । महापातकांसी पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥1॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । लागलें मुनिवरां गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥2॥ ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा द्यावयासी उदार । जया वोळगती सििद्ध सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाइऩ ॥3॥ असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हें धरुनि भिHलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली हे सिद्धसाधकांची ॥4॥ करा वेगु हा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तें च साधीं । म्हणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥5॥ 1106 धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं । मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी तें तृप्त नाहीं ॥1॥ न दिसे शुद्ध पाहातां निजमती । पुढें पडिलों इंिद्रयां थोर घातीं । जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडीं ॥2॥ असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता । क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥3॥ निज देखतां निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभ यी भीत आहे । तयां विस्त देहीं नको देउं देवा । तुजवांचुनी आणिक नािस्त हेवा ॥4॥ करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भिH दूरी । नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥5॥ 1107 पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुबिऩलीं साजिरीं मोरवीसें । हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥1॥ जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥2॥ असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥3॥ कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं। कसी वीट हे लाधली दैवांची। जया चिंतितां अिग्न हा शांति नीवे। धरा मानसीं आपला देहभाव ॥4॥ मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय। देह मांडला भाव हा बापमाय। तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥5॥ 1108 असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अिग्न हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥1॥ तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं । तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥2॥ फळ कदऩळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये । धीर नाहीं त्यें वाउगें धीग जालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥3॥ असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें। असे बिंब तें या मळा आहे ठेलें । कैसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥4॥ करा वर्म ठावें नका सोंग वांयां। तुका वीनवीतो पडों काय पायां । तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥5॥ 1109 मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥1॥ ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों । भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥2॥ जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये । करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥3॥ ॥6॥ 1110 सुटायाचा कांहीं पाहातों उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥1॥ ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुिद्ध बळ माझें ॥ध्रु.॥ प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥2॥ विधिनिषेधाचे सांपडलों चपे । एकें एक लोपे निवडेना ॥3॥ सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥4॥ तुका ह्मणे आतां करीं सोडवण । सर्वशिHहीन जालों देवा ॥5॥ 1111 भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥1॥ ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा ह्मणउनी ॥ध्रु.॥ विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥3॥ 1112 येगा येगा पांडुरंगा । घेइऩ उचलुनि वोसंगा ॥1॥ ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥2॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥3॥ तुका ह्मणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥4॥ 1113 माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥1॥ कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ‍ कोंवळी ॥2॥ तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥3॥ 1114 आह्मी उतराइऩ । भाव निरोपूनि पायीं ॥1॥ तुह्मी पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥ आमचा हा नेम । तुह्मां उचित हा धर्म ॥2॥ तुका ह्मणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥3॥ 1115 केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥1॥ विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥ देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक ह्मुण ॥2॥ तुका ह्मणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥3॥ 1116 विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥1॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥ विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुिप्त । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥2॥ भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥3॥ तुका ह्मणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥4॥ 1117 दास जालों हरिदासांचा । बुिद्धकायामनेंवाचा ॥1॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंगकल्लोळ । नासे दुष्टबुिद्ध सकळ । समाधि हरिकीर्त्तनीं ॥ध्रु.॥ ऐकतां हरिकथा । भिH लागे त्या अभHां ॥2॥ देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥3॥ हें सुख ब्रह्मादिकां । ह्मणे नाहीं नाहीं तुका ॥4॥ 1118 गति अधोगति मनाची युिH । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥1॥ जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥ मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥2॥ तुका ह्मणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौ†याशीचा ॥3॥ 1119 पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥1॥ पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥ उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥2॥ पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥3॥ तुका ह्मणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥4॥ 1120 द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भHराया चोजवीत ॥1॥ गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥ वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥2॥ लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांटविलें ॥3॥ तुका ह्मणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥4॥ 1121 सुरवर येती तीथॉ नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥1॥ साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥ पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥2॥ निविऩषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥3॥ तुका ह्मणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घेइप कोटि ॥4॥ 1122 विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे Yाान पाठी भार लगड तैसा ॥1॥ वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥ सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥2॥ नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका ह्मणे काय मुद्रासोंग जािळसी ॥3॥ 1123 देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥1॥ दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥2॥ तुका ह्मणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥3॥ 1124 कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥1॥ ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥ तप व्रत करितां लागती सायास । पािळतां पिंडास गोड वाटे ॥2॥ देव ह्मणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥3॥ तुका ह्मणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥4॥ 1125 नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥1॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥ तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥2॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वणिऩतां ते गुण न सरती ॥3॥ तुका ह्मणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥4॥ 1126 अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥1॥ घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥ मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥2॥ नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥3॥ तुका ह्मणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥4॥ 1127 उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥1॥ सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥ पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥2॥ चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥3॥ तुका ह्मणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥4॥ 1128 काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥1॥ मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥ होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥2॥ अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥3॥ तुका ह्मणे तुझे पाय आतुडती । ते मज विपित्त गोड देवा ॥4॥ 1129 मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥1॥ तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥ करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥2॥ नव्हे साच कांहीं कळों आलें मना । ह्मणोनि वासना आवरिली ॥3॥ तुका ह्मणे आतां मनोरथ सिद्धी। माझे कृपानिधी पाववावे ॥4॥ 1130 आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥1॥ सर्वभावें नाम गाइऩन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥2॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥3॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका ह्मणे ॥4॥ 1131 जनीं जनादऩन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आह्मां ॥1॥ जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥ पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥2॥ आह्मां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥3॥ तुका ह्मणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥4॥ 1132 यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥1॥ चोरा धरितां सांगे कुठो†याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥2॥ तुका ह्मणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥3॥ 1133 धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥1॥ सुखें करावें कीर्तन हषॉ गावे हरिचे गुण। वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥ जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥2॥ हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका ह्मणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥3॥ 1134 पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥1॥ सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥ पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥2॥ तुका ह्मणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥3॥ 1135 दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥1॥ हें चि वर्म आह्मां भाविकांचे हातीं । ह्मणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥ लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । ये†हवी तें ओझें कोण वाहे ॥2॥ तुका ह्मणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥3॥ 1136 वीर विठ्ठलाचे गाढे । किळकाळ पायां पडे ॥1॥ करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥2॥ तुका ह्मणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥3॥ 1137 ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥1॥ मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण। भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील किळकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रििद्धसिद्धी ह्मणियारीं ॥2॥ सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हा चि करिती पुराणें ॥3॥ ब्राह्मण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥4॥ तुका ह्मणे अनुभवें आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥5॥ 1138 न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥1॥ अविनाश सुख देइऩल निर्वाणी । चुकतील खाणी चौ†याशीच्या ॥ध्रु.॥ आणिकिया जीवां होइऩल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥2॥ आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥3॥ तुका ह्मणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥4॥ 1139 कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥1॥ मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥ आणीक ही भोग आणिकां इंिद्रयांचे। नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥2॥ रूप दृिष्ट धाय पाहातां पाहातां। न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥3॥ तुका ह्मणे कां रे नाशिवंतासाटीं। देवासवें तुटी करितोसी ॥4॥ 1140 बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देइऩल तो अन्नवस्त्रदाता ॥1॥ काय आह्मां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥ दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥2॥ न लगे मागणें सांगणें तयासी। जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥3॥ तुका ह्मणे लेइप अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥4॥ 1141 सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥1॥ काय करावें प्रमाण । तुह्मी सांगा संतजन ॥ध्रु.॥ मृित्तकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥2॥ तुका ह्मणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥3॥ सेतावर - अभंग 3 1142 सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥1॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं ह्मणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥ जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥2॥ कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥3॥ Yाानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥4॥ बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥5॥ नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागो†याच्या नेटें ॥6॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥7॥ सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥8॥ प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥9॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका ह्मणे धिग त्याला ॥10॥ 1143 वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥1॥ तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥ चोरासवें वाट ॥ चालोनि केलें तळपट ॥ 2॥ डोळे झांकुनि राती ॥ कूर्पी पडे दिवसा जोती ॥3॥ पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥4॥ फुटकी सांगडी । तुका ह्मणे न पवे थडी ॥5॥ 1144 सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥1॥ सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥ गोफणेसी गुंडा घालीं पागो†याच्या नेटें। पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥2॥ पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुिद्ध व्हावीं दोनी ॥3॥ खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देइप त्यासी ॥4॥ तुका ह्मणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥5॥ ॥3॥ 1145 नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥1॥ नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥2॥ तुका ह्मणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥3॥ उतराधिपदें - 22 1146 क्या गाऊं कोइऩ सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥1॥ खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥ काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऐसी लोक बिराणी ॥2॥ गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ॥3॥ 1147 छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥1॥ तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥ तुलसीमाला बभूत च†हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥2॥ कहे तुका जो साइप हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥3॥ 1148 मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥1॥ राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥ अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥2॥ कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥3॥ 1149 चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥1॥ काहे बडाइऩ दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा तेरा खव हि ॥ध्रु.॥ और बात सुन उखळसुं गळा । बांधलिया आपना तूं गोपाळा ॥2॥ फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥3॥ 1150 हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥1॥ मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥ हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥2॥ देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥3॥ 1151 क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥1॥ क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥ किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥2॥ कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥3॥ 1152 कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥1॥ जग रडे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदमाहि पैठा ॥ध्रु.॥ भला पाऊं जनम इऩhहे बेर । बस मायाके असंग फेर ॥2॥ कहे तुका धन मानहि दारा । वोहिलिये गुंडलीयें पसारा ॥3॥ 1153 दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥1॥ प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥ आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥2॥ तुका प्रभु दीनदयाला। वारि रे तुज पर हुं गोपाला ॥3॥ 1154 ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥ इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥1॥ अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥2॥ तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥3॥ 1155 मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥1॥ जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥2॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥3॥ 1156 आपे तरे त्याकी कोण बराइऩ । औरनकुं भलो नाम घराइऩ ॥ध्रु.॥ काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥1॥ बरसतें मेघ फलतेंहें बिरखा । कोन काम अपनी उन्होति रखा ॥2॥ काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥3॥ काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥4॥ कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥5॥ 1157 जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥ नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥1॥ उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥2॥ देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥3॥ 1158 भले रे भाइऩ जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥ फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥1॥ तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥2॥ कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥3॥ 1159 लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥ कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥1॥ नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥2॥ और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥3॥ 1160 राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंब न पाइऩ ॥ध्रु.॥ कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥1॥ कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥2॥ कहे तुका सब हि चेलhहार । एकारामविन नहिं वासार ॥3॥ 1161 काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ध्रु.॥ राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥1॥ माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥2॥ राना रंग डोंगरकी राइऩ । कहे तुका करे इलाहि ॥3॥ 1162 काहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥ध्रु.॥ केते मालुम नहिं पडे । नन्हे बडे गये सो ॥1॥ बाप भाइऩ लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥2॥ काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥3॥ 1163 क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥ध्रु.॥ तनजोबनकी कोन बराइऩ । ब्याधपीडादि स काटहि खाइऩ ॥1॥ कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥2॥ कहे तुका नहिं समज्यात मात । तुह्मारे शरन हे जोडहि हात ॥3॥ 1164 देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥ मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥1॥ कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥2॥ कहे तुका वो संन्यास। छोडे आस तनकी हि ॥3॥ 1165 रामभजन सब सार मिठाइऩ । हरि संताप जनमदुख राइऩ ॥ध्रु.॥ दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥1॥ खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥2॥ कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥3॥ 1166 बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥ ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥1॥ रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥2॥ कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥3॥ 1167 हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिइऩ लंका ॥ध्रु.॥ गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥1॥ वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥2॥ स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाइऩ तुकयाका ॥3॥ ॥22॥ ॥ साख्या ॥ 30 ॥ 1168 तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय। भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥1॥ 1169 रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज । बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥1॥ 1170 लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम । माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥1॥ 1171 तुका पंखिबहिरन मानुं । बोइऩ जनावर बाग । असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥1॥ 1172 तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर । तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥1॥ 1173 संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार । चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥1॥ 1174 तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम । बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥1॥ 1175 राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड । हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥1॥ 1176 राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख । आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥1॥ 1177 कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार । मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥1॥ 1178 तुका दास तिनका रे । रामभजन निरास । क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥1॥ 1179 तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख । पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥1॥ 1180 कहे तुका जग भुला रे । कहएा न मानत कोय । हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥1॥ 1181 तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये । चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥1॥ 1182 तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये । एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥1॥ 1183 तुका मा†या पेटका । और न जाने कोये । जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥1॥ 1184 काफर सोही आपण बुझे । आला दुनियां भर । कहे तुका तुम्हें सुनो रे भाइऩ । हिरिदा जिन्होका कठोर ॥1॥ 1185 भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये । निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥1॥ 1186 फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥1॥ 1187 तुका दास रामका । मनमे एक हि भाव । तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥1॥ 1188 तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात । धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥1॥ 1189 चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये । तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥1॥ 1190 चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग । पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥1॥ 1191 तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये । दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥1॥ 1192 तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय । उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराइऩ ॥1॥ 1193 तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय । जबथे इच्छा नहिं मुइऩ । तब तूं किया काय ॥1॥ 1194 तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक । मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥1॥ 1195 ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास । सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥1॥ 1196 कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास । क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥1॥ 1197 तुका और मिठाइऩ क्या करूं रे । पाले विकारपिंड । राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥1॥ ॥30॥ 1198 ह्मणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥1॥ लाहो घेइप हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥ गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि ह्मणसी ॥2॥ पुरलासाटीं देहाडा। ऐसें न ह्मणें न ह्मणें मूढा ॥3॥ नरदेह दुबळा । ऐसें न ह्मणें रे चांडाळा ॥4॥ तुका ह्मणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥5॥ 1199 संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शािब्दकांचे काम नाहीं येथें ॥1॥ बहु धड जरी जाली ह्मैस गाय । तरी होइऩल काय कामधेनु ॥2॥ तुका ह्मणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येइऩल कळों ॥3॥ 1200 नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥1॥ नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥1॥ तुका ह्मणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥3॥ [[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]] 63bye4zs2v8eryjzf07vj5xeat8layx 36909 36898 2026-09-19T19:41:53Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36909 wikitext text/x-wiki 901 जीवन हे मुH नर जाले पावन । तजा हो दुर्जनसंगति ही ॥1॥ बहुत अन्न विष मोहरीच्या मानें । अवघें चि तेणें विष होय ॥2॥ तुका ह्मणे जेणें आपलें स्वहित । तैसी करीं नीत विचारूनि ॥3॥ 902 द्रव्याचा तो आह्मी धरितों विटाळ । तया पाठी काळ लाग करी ॥1॥ करोनियां हें चि राहिलों जीवन । एक नारायण नाम ऐसें ॥2॥ तुका ह्मणे हें चि करुनि जतन । आलिया ही दान याचकासी ॥3॥ 903 द्रव्याचिया मागें किळकाळाचा लाग । ह्मणोनियां संग खोटा त्याचा ॥1॥ निरयाचें मूळ घालुनिया मागें । मांडिली प्रसंगें कथा पुढें ॥ध्रु.॥ आजिच्या प्रसंगें हा चि लाभ घ्यावा । पुढील भार देवावरी घाला ॥2॥ प्रालब्ध कांहीं न पालटे सोसें । तृष्णेचें हें पिसें वांयांविण ॥3॥ तुका ह्मणे घेइप राहे ऐसें धन । सादर श्रवण करोनियां ॥4॥ 904 रडे अळंकार दैन्याचिये कांती । उतमा विपित्तसंग घडे ॥1॥ एकाविण एक अशोभ दातारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ रांधूं नेणे तया पुढील आइतें । केलें तें सोइतें वांयां जाय ॥2॥ तुका ह्मणे चिंतामणि शेळी गळा । पावे अवकळा ह्मणउनी ॥3॥ 905 दुःखाचे डोंगर लागती सोसावे । ऐसें तंव ठावें सकळांसीं ॥1॥ कांहीं न करिती विचार हिताचा । न करिती वाचा नामघोष ॥ध्रु.॥ भोग कळों येतो मागिल ते जन्म । उत्तम मध्यम कनिष्ठ ते ॥2॥ तुका ह्मणे येथें झांकितील डोळे । भोग देतेवेळे येइल कळों ॥3॥ 906 सदैव तुह्मां अवघें आहे । हातपाय चालाया ॥1॥ मुखीं वाणी कानीं कीतिऩ । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥ अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥2॥ घरास आगि लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥3॥ तुका ह्मणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥4॥ 907 ऐसे पुढती मिळतां आतां । नाहीं सत्ता स्वतंत्र ॥1॥ म्हणउनि फावलें तें घ्यावें । नाम गावें आवडी ॥ध्रु.॥ संचित प्रारब्ध गाढें । धांवे पुढें क्रियमाण ॥2॥ तुका ह्मणे घुबडा ऐसें । जन्म सरिसे शुकराचें ॥3॥ 908 सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडे एक ॥1॥ संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक ह्मणतां माझें कोणी ॥ध्रु.॥ देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥2॥ उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥3॥ तुका ह्मणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥2॥ 909 आणीक कांहीं या उत्तराचें काज । नाहीं आतां मज बोलावया ॥1॥ भिन्न भेद हे भावनास्वभाव । नव्हे कांहीं देव एकविध ॥ध्रु.॥ गुण दोष कोणें निवडावे धर्म । कोण जाणे कर्म अकर्म तें ॥2॥ तरिच भलें आतां न करावा संग । दुःखाचा प्रसंग तोडावया ॥3॥ तुका ह्मणे गुण गाइप या देवाचे । घेइप माझे वाचे हे चि धणी ॥4॥ 910 आपुल्या विचार करीन जीवाशीं । काय या जनाशीं चाड मज ॥1॥ आपुलें स्वहित जाणती सकळ । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ध्रु.॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥2॥ माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥3॥ तुका ह्मणे भाकुं आपुली करुणा । जयाची वासना तथा फळे ॥4॥ 911 धाइप अंतरिंच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥1॥ विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ध्रु.॥ वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥2॥ अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥3॥ साधनाची सििद्ध । मोन करा िस्थर बुिद्ध ॥4॥ तुका ह्मणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥5॥ 912 कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥1॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥2॥ तुका ह्मणे लागे हातां । काय मथिलें घुसिळतां ॥3॥ 913 संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥1॥ विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥ करितो कवतुक बोबडा उत्तरी । झणी मजवरि कोप धरा ॥2॥ काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥3॥ तुका ह्मणे मज बोलवितो देव । अर्थ गुहए भाव तो चि जाणे ॥4॥ 914 चंदनाच्या वासें धरितील नाक । नावडे कनक न घडे हें ॥1॥ साकरेसी गोडी सारिखी सकळां । थोरां मोटएां बाळां धाकुटियां ॥2॥ तुका ह्मणे माझें चित्त शुद्ध होतें । तरि का निंदितें जन मज ॥3॥ 915 तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलें चि देसी पद दासा ॥1॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥2॥ भावें हें कदान्न खासी त्याचे घरीं । अभHांची परी नावडेती ॥3॥ न वजासी जेथें दुरी दवडितां । न येसी जो चित्ता योगियांच्या ॥4॥ तुका ह्मणे ऐसीं ब्रीदें तुझीं खरीं । बोलतील चारी वेद मुखें ॥5॥ 916 तरि कां नेणते होते मागें ॠषी । तींहीं या जनासी दुराविलें ॥1॥ वोळगती जया अष्टमासििद्ध । ते या जनबुद्धी नातळती ॥2॥ कंदमूळें पाला धातूच्या पोषणा । खातील वास राणां तरी केला ॥3॥ लावुनियां नेत्र उगे चि बैसले । न बोलत ठेले मौन्यमुद्रे ॥4॥ तुका ह्मणे ऐसें करीं माझ्या चित्ता । दुरावीं अनंता जन दुरी ॥5॥ 917 कोणाच्या आधारें करूं मी विचार । कोण देइल धीर माझ्या जीवा ॥1॥ शास्त्रYा पंडित नव्हें मी वाचक । यातिशुद्ध एक ठाव नाहीं ॥2॥ कलियुगीं बहु कुशळ हे जन । छिळतील गुण तुझे गातां ॥3॥ मज हा संदेह झाला दोहीं सवा । भजन करूं देवा किंवा नको ॥4॥ तुका ह्मणे आतां दुरावितां जन । किंवा हें मरण भलें दोन्ही ॥5॥ 918 काय उणें जालें तुज समर्थासी । ऐसा मजपाशीं कोण दोष ॥1॥ जो तूं माझा न करिसी अंगीकार । सांगेन वेव्हार संतांमधीं ॥2॥ तुजविण रत आणिकांचे ठायीं । ऐसें कोण ग्वाही दावीं मज ॥3॥ तुका ह्मणे काय धरूनी गुमान । सांग उगवून पांडुरंगा ॥4॥ 919 काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥1॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥ अनेक दीपीचा प्रकाश । सूर्य उगवतां नाश ॥2॥ तुका ह्मणे नेणें दुजें । एका विण पंढरीराजें ॥3॥ 920 काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥1॥ होसी नामा च सारिका । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥ नाहीं वेचावेच जाला । उरला आहेसी संचला ॥2॥ तुका ह्मणे माझें । काय होइऩल तुह्मां ओझें ॥3॥ 921 एकाएकीं हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥1॥ आह्मी देवा शिHहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥ पावटणी केला काळ । जया बळ होतें तें ॥2॥ तुका ह्मणे वीर्यावीर । संतधीर समुद्र ॥3॥ 922 पुढिलाचें इच्छी फळ । नाहीं बळ तें अंगीं ॥1॥ संत गेले तया ठाया । देवराया पाववीं ॥ध्रु.॥ ज्येष्ठांचीं कां आह्मां जोडी। परवडी न लभों ॥2॥ तुका ह्मणे करीं कोड । पुरवीं लाड आमुचा ॥3॥ 923 कैवल्याच्या तुह्मां घरीं । रासी हरी उदंड ॥1॥ मजसाठीं कां जी वाणी । नव्हे धणी विभागा ॥ध्रु.॥ सर्वा गुणीं सपुरता । ऐसा पिता असोनी ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । जालों सांगा सन्मुख ॥3॥ 924 आपलाल्या तुह्मी रूपासी समजा । कासया वरजा आरसिया ॥1॥ हें तों नव्हे देहबुद्धीचें कारण । होइल नारायणें दान केलें ॥ध्रु.॥ बब्रूचिया बाणें वर्मासि स्पर्शावें । हें तों नाहीं ठावें मोकलित्या ॥2॥ तुका ह्मणे बहु मुखें या वचना । सत्याविण जाणा चाल नाहीं ॥3॥ 925 न मनावी चिंता तुह्मीं संतजनीं । हिरा स्पटिकमणी केंवि होय ॥1॥ पडिला प्रसंग स्तळा त्या सारिखा । देखिला पारिखा भाव कांहीं ॥ध्रु.॥ बहुतांसी भय एकाचिया दंडें । बहुत या तोंडें वचनासी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं वैखरी बा सर । करायाचे चार वेडे वेडे ॥3॥ 926 यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरि हे नाहीं ॥1॥ आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥ मंगळ तें तुह्मी जाणां । नारायणा काय तें ॥2॥ तुका ह्मणे समपिऩला । तुज विठ्ठला देहभाव ॥3॥ 927 भवसिंधूचें हें तारूं । मज विचारूं पाहातां ॥1॥ चित्तीं तुझे धरिन पाय । सुख काय तें तेथें ॥ध्रु.॥ माझ्या खुणा मनापाशीं। तें या रसीं बुडालें ॥2॥ तुका ह्मणे वर्म आलें । हातां भलें हें माझ्या ॥3॥ 928 पाहातां श्रीमुख सुखावलें सुख । डोिळयांची भूक न वजे माझी ॥1॥ जिव्हे गोडी तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिकें पुढें ॥ध्रु.॥ श्रवणीची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद वारोनियां ॥2॥ महामळें मन होतें जें गांदलें । शुद्ध चोखाळलें स्पटिक जैसें ॥3॥ तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । विठ्ठल निधान सांपडलें ॥4॥ 929 हा चि परमानंद आळंगीन बाहीं । क्षेम देतां ठायीं द्वैत तुटे ॥1॥ बोलायासि मात मन निवे हरषें चित्त । दुणी वाढे प्रीत प्रेमसुख ॥ध्रु.॥ जनांत भूषण वैकुंठीं सरता । फावलें स्वहिता सर्वभावें ॥2॥ तुटला वेव्हार माया लोकाचार । समूळ संसार पारुषला ॥3॥ तुका ह्मणे हा विठ्ठल चि व्हावा । आणिकी या जीवा चाड नाहीं ॥4॥ 930 आमुची कृपाळू तूं होसी माउली । विठ्ठले साउली शरणागता ॥1॥ प्रेमपान्हा स्तनीं सदा सर्वकाळ । दृिष्ट हे निर्मळ अमृताची ॥ध्रु.॥ भूक तान दुःख वाटों नेदीं सीण । अंतरींचा गुण जाणोनियां ॥2॥ आशा तृष्णा माया चिंता दवडीं दुरी । ठाव आह्मां करीं खेळावया ॥3॥ तुका ह्मणे लावीं संताचा सांगात । जेथें न पवे हात किळकाळाचा ॥4॥ 931 जेथें जावें तेथें कपाळ सरिसें । लाभ तो विशेषें संतसंगें ॥1॥ पूर्व पुण्यें जरि होतीं सानुकूळ । अंतरायमूळ नुपजे तेथें ॥ध्रु.॥ भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा । निकट वास बरा संतांपायीं ॥2॥ तुका ह्मणे हे चि करावी मिरासी । बळी संतांपाशीं द्यावा जीव ॥3॥ 932 आतां कांहीं सोस न करीं आणीक । धरीन तें एक हें चि दृढ ॥1॥ जेणें भवसिंधु उतरिजे पार । तुटे हा दुस्तर गर्भवास ॥ध्रु.॥ जोडीन ते आतां देवाचे चरण । अविनाश धन परमार्थ ॥2॥ तुका ह्मणे बरा जोडला हा देह । मनुष्यपणें इहलोका आलों ॥3॥ 933 जतन करीन जीवें । शुद्धभावें करूनी ॥1॥ विठ्ठल विठ्ठल हें धन । जीवन अंतकाळींचें ।ध्रु.॥ वदऩळ हें संचित सारूं । बरवा करूं उदिम हा ॥2॥ तुका ह्मणे हृदयपेटी । ये संपुटीं सांटवूं ॥3॥ 934 एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ॥1॥ होय भHीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ॥ध्रु.॥ एवढा जगदानी। मागे तुळसीदळ पाणी ॥2॥ आला नांवा रूपा । तुका ह्मणे जाला सोपा ॥3॥ 935 भाग्यें ऐसी जाली जोडी । आतां घडी विसंभेना ॥1॥ विटेवरी समचरण । संतीं खुण सांगितली ॥ध्रु.॥ अवघें आतां काम सारूं । हा चि करूं कैवाड ॥2॥ तुका ह्मणे खंडूं खेपा । पुढें पापापुण्याच्या ॥3॥ 936 पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण । आह्मां नारायण तैशापरी ॥1॥ सर्वभावें लोभ्या आवडे हें धन । आह्मां नारायण तैशापरी ॥2॥ तुका ह्मणे एकविध जालें मन । विठ्ठला वांचून नेणे दुजें ॥3॥ 937 विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥1॥ अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥ तो चि शरणागतां हा विठ्ठल मुिHदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥2॥ विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सििद्ध। लागली समाधि विठ्ठलनामें ॥3॥ विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख। गोडावलें मुख तुका ह्मणे ॥4॥ 938 विठो सांपडावया हातीं । ठावी जाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥1॥ लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥ एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥2॥ बांधा माझिया जीवासी । तुका ह्मणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥3॥ 939 वाट वैकुंठीं पाहाती । भH कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥1॥ धन्यधन्य हरिचे दास। तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥ कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस। वाट कर जोडोनियां ॥2॥ रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरिभHां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भHांची ॥3॥ असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥4॥ सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका ह्मणे दरुषणें ॥5॥ 940 सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साटीं विकुं पाहे ॥1॥ पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥ क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तो चि भिन्न भिन्न काढी ॥2॥ तुका ह्मणे थीता नागवला चि खोटा । अपमान मोटा पावइऩल ॥3॥ 941 फोडुनि सांगडी बांधली माजासी । पैल थडी कैसी पावे सहजीं ॥1॥ आपला घात आपण चि करी । आणिकां सांगतां नाइके तरी ॥ध्रु.॥ भुकेभेणें विष देऊ पाहे आतां । आपल्या चि घाता करूं पाहे ॥2॥ तुका ह्मणे एक चालतील पुढें । तयांसी वांकडें जातां ठके ॥3॥ 942 उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आह्मां चाड ॥1॥ बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा ह्मणउनि ॥2॥ तुका ह्मणे माझे देखतिल डोळे । भोग देते वेळे येइऩल कळों ॥3॥ 943 आठवे देव तो करावा उपाव । येर तजीं वाव खटपटा ॥1॥ होइप बा जागा होइप वा जागा । वाउगा कां गा सिणसील ॥ध्रु.॥ जाणिवेच्या भारें भवाचिये डोहीं । बुडसी तों कांहीं निघेसि ना ॥2॥ तुका ह्मणे देवा पावसील भावें । जाणतां तें ठावें कांहीं नव्हे ॥3॥ 944 माझ्या मुखावाटा नयो हें वचन । व्हावें संतान द्रव्य कोणां ॥1॥ फुकाचा विभाग पतनदुःखासी । दोहींमुळें त्यासी तें चि साधे ॥ध्रु.॥ नाइकावी निंदा स्तुति माझ्या कानें । सादर या मनें होऊनियां ॥2॥ तुका ह्मणे देव असाध्य यामुळें । आशामोहजाळें गुंतलिया ॥3॥ 945 चित्त ग्वाही तेथें लौकिकाचें काइऩ । स्वहित तें ठायीं आपणापें ॥1॥ मनासी विचार तो चि साच भाव । व्यापक हा देव अंतर्बाहीं ॥ध्रु.॥ शुद्ध भावा न लगे सुचावा परिहार । उमटे साचार आणिके ठायीं ॥2॥ भोगित्यासी काज अंतरीचें गोड । बाहिरल्या चाड नाहीं रंगें ॥3॥ तुका ह्मणे भाव शुद्ध हें कारण । भाट नारायण होइऩल त्यांचा ॥4॥ 946 नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥1॥ कांहीं न धरावी खंती । हित होइल धरा चित्तीं ॥ध्रु.॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगतां ॥2॥ ज्याचें तो चि जाणें । मी मापाडें तुका ह्मणे ॥3॥ 947 वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥1॥ या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥ सर्वकाळ हा चि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥2॥ तुका ह्मणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥3॥ 948 चिंतनें अचिंत राहिलों निश्चळ । तें चि किती काळ वाढवावें ॥1॥ अबोल्याचा काळ आतां ऐशावरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ध्रु.॥ करूं आला तों तों केला लवलाहो । उरों च संदेहे दिला नाहीं ॥2॥ तुका ह्मणे मोह परते चि ना मागें । ह्मणउनि त्यागें त्याग जाला ॥3॥ 949 निर्गुणाचे घ्यावें गुणासी दर्शन । एकाएकीं भिन्न भेद घडे ॥1॥ तुह्मां आह्मां आतां न पडे यावरी । आहों तें चि बरी जेथें तेथें ॥ध्रु.॥ आपणापासुनी नसावें अंतर । वेचिलें उत्तर ह्मणउनि ॥2॥ तुका ह्मणे अंगा आली कठिन्यता । आमच्या अनंता तुह्मां ऐसी ॥3॥ 950 तुज च पासाव जालोंसों निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥1॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । नुन्य कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं आYोचें पाळण । करूनि जतन राहिलोंसें ॥2॥ तुका ह्मणें आतां बोलतसें स्पष्ट । जालों क्रियानष्ट तुह्माऐसा ॥3॥ 951 प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भिHरस सांगा कां जी तुह्मीं ॥1॥ ह्मणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥ न देखों चि कांहीं परती माघारी । उरली ते उरी नाहीं मुळीं ॥2॥ तुका ह्मणे आला अंतरासी खंड । तरि माझें तोंड खविळलें ॥3॥ 952 लटिका ऐसा ह्मणतां देव । संदेहसा वाटतसे ॥1॥ ऐसें आलें अनुभवा । मज ही सेवा करिता ॥ध्रु.॥ शून्याकारी बहु मोळा । भेंडोळा हे पवाडे ॥2॥ तुका ह्मणे ताळी नाहीं । एके ठायीं चपळत्वें ॥3॥ 953 जैशासाठीं तैसें हावें । हें बरवें कळलेंसे ॥1॥ उदास तूं नारायणा । मी ही ह्मणा तुह्मी च ॥ध्रु.॥ ठका महाठक जोडा । जो धडफुडा लागासी ॥2॥ एकांगी च भांडे तुका । नाहीं धोका जीवित्वें ॥3॥ 954 बहुतां रीती काकुलती । आलों चित्तीं न धरा च ॥1॥ आतां काशासाटीं देवा । मिथ्या हेवा वाढवूं ॥ध्रु.॥ तुह्मां आह्मां जाली तुटी । आतां भेटी चिंतनें ॥2॥ तुका ह्मणे लाजिरवाणें । आधर जिणें इच्छेचें ॥3॥ 955 आश्चर्य तें एक जालें । मना आलें माझिया ॥1॥ मढएापाशीं करुणा केली । तैसी गेली वृथा हे ॥ध्रु.॥ न यावा तो कैसा राग । खोटें मग देखोनि ॥2॥ तुका ह्मणे कैंचा बोला । शोध विठ्ठला माझिया ॥3॥ 956 मागायाची नाहीं इच्छा । जो मी ऐसा संकोचों ॥1॥ लटिकियाची न करूं स्तुति । इच्छा चित्तीं धरूनि ॥ध्रु.॥ हिशोबें तें आलें घ्यावें । हें तों ठावें सकळांसी ॥2॥ तुका ह्मणे स्वामिसेवा । येथें देवा काशाची ॥3॥ 957 पाठवणें पडणें पायां । उद्धार वांयां काशाचा ॥1॥ घडलें तें भेटीसवें । दिसेल बरवें सकळां ॥ध्रु.॥ न घडतां दृष्टादृष्टी। काय गोष्टी कोरडएा ॥2॥ अबोल्यानें असे तुका । अंतर ऐका साक्षीतें ॥3॥ 958 अभयाचें स्थळ । तें हें एक अचळ ॥1॥ तरि धरिला विश्वास । ठेलों होउनियां दास ॥ध्रु.॥ पुरली आवडी । पायीं लागलीसे गोडी ॥2॥ तुका ह्मणे कंठीं नाम । अंगीं भरलें सप्रेम ॥3॥ 959 संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥1॥ आतां नको मज खोटएानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥ गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥2॥ तुका ह्मणे कसीं निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥3॥ 960 वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥1॥ आह्मी ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंतितसे ॥ध्रु.॥ वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥2॥ तुका ह्मणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभयें करें ॥3॥ 961 उगें चि हें मन राहातें निश्चळ । तरि कां तळमळ साट होती ॥1॥ काय तुमचीं नेणों कवतुक विंदानें । सवाौत्तमपणें खेळतसां ॥ध्रु.॥ नानाछंदें आह्मां नाचवावें जीवां । वाढवाव्या हांवा भलत्यापुढें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी आपुली प्रतिष्ठा । वाढवावया चेष्टा करीतसां ॥3॥ 962 आह्मी बळकट जालों फिराउनी । तुमच्या वचनीं तुह्मां गोऊं ॥1॥ जालें तेव्हां जालें मागील तें मागें । आतां वर्मलागें ठावीं जालीं ॥ध्रु.॥ तोडावया अवघ्या चेष्टांचा संबंध । शुद्धापाशीं शुद्ध बुद्ध व्हावें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां आत्मत्वाची सोय । आपण चि होय तैसा चि तूं ॥3॥ 963 तुह्मी साच नुपेक्षाल हा भरवसा । मज जाणतसां अधीरसें ॥1॥ कासया घातला लांबणी उद्धार । ठेवा करकर वारूनियां ॥ध्रु.॥ सुटों नये ऐसें कळले निरुतें । कां घ्यावें मागुतें आळवुनि ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी सभाग्य जी देवा । माझा तुह्मां केवा काय आला ॥3॥ 964 तुह्मां होइऩल देवा पडिला विसर । आह्मीं तें उत्तर यत्न केलें ॥1॥ पतितपावन ब्रीदें मिरविसी । याचा काय देसी झाडा सांग ॥ध्रु.॥ आहाच मी नव्हें अर्थाचें भुकेलें । भलत्या एका बोलें वारेन त्या ॥2॥ तुका ह्मणे देह देइऩन सांडणें । सहित अभिमानें ओवाळूनि ॥3॥ 965 जडलों अंगाअंगीं । मग ठेवीं प्रसंगीं । कांहीं उरीजोगी। लोकीं आहे पुरती ॥1॥ ठेवीं निवारुनि आधीं । अवकाश तो चि बुद्धी । सांपडली संधी । मग बळ कोणासी ॥ध्रु.॥ गळा बांधेन पायीं । हालों नेदीं ठायिचा ठायीं । निवाड तो तइप । अवकळा केलिया ॥2॥ तुका ह्मणे ठावे । तुह्मी असा जी बरवे । बोभाटाची सवे । मुळींहुनी विठोबा ॥3॥ 966 आह्मी शिHहीनें । कैसें कराल तें नेणें । लिगाडाच्या गुणें । खोळंबला राहिलों ॥1॥ माझें मज देइप देवा । असे ठेविला तो ठेवा । नाहीं करीत हेवा । कांहीं अधीक आगळा ॥ध्रु.॥ नाहीं गळां पडलों झोंड । तुमचें तें चि माझें तोंड । चौघां चार खंड । लांबणी हे अनुचित ॥2॥ नाहीं येत बळा । आतां तुह्मासी द्मगोपाळा । तुका ह्मणे गळा । उगवा पायां लागतों ॥3॥ 967 काय कृपेविण घालावें सांकडें । नििंश्चती निवाडें कोण्या एका ॥1॥ आहों तैसीं पुढें असों दीनपणें । वेचूनि वचनें करुणेचीं ॥ध्रु.॥ धरूं भय आतां काय वाहों चिंता । काय करूं आतां आप्तपण ॥2॥ तुका ह्मणे आह्मी भावहीन जीव । ह्मणउनी देव दुरे दुरी ॥3॥ 968 नाहीं उल्लंघिले कोणाचे वचन । मज कां नारायण दुरी जाला ॥1॥ अशंकितें मनें करीं आळवण । नाहीं समाधान नििंश्चतीचें ॥ध्रु.॥ दासांचा विसर हें तों अनुचित । असे सर्व नीत पायांपाशीं ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां लाज येत नाहीं । आह्मां चिंताडोहीं बुडवितां ॥3॥ 969 जीव जायवरी सांडी करी माता । हे तों आश्चर्यता बाळकाची ॥1॥ दुर्बळ कीं नाहीं आइकत कानीं । काय नारायणीं न्यून जालें ॥ध्रु.॥ क्षणक्षणा माझा ने घावा सांभाळ । अभाग्याचा काळ ऐसा आला ॥2॥ तुका ह्मणे नाहीं वचनासी रुचि । फल कटवें चि तें तें होय ॥3॥ 970 ह्मणउनी दास नव्हे ऐसा जालों । अनुभवें बोलों स्वामीपुढें ॥1॥ कां नाहीं वचन प्रतिउत्तराचें । मी च माझ्या वेचें अट्टाहासें ॥ध्रु.॥ कासयाने गोडी उपजावा विश्वास । प्रीती कांहीं रस वाचुनियां ॥2॥ तुका ह्मणे अगा चतुरा शिरोमणी । विचारावें मनीं केशीराजा ॥3॥ 971 काय आतां आह्मीं पोट चि भरावें । जग चाळवावें भH ह्मुण ॥1॥ ऐसा तरि एक सांगा जी विचार । बहु होतों फार कासावीस ॥ध्रु.॥ काय कवित्वाची घालूनियां रूढी । करूं जोडाजोडी अक्षरांची ॥2॥ तुका ह्मणे काय गुंपोनि दुकाना । राहों नारायणा करुनी घात ॥3॥ 972 वर्म तरि आह्मां दावा । काय देवा जाणें मी ॥1॥ बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥ द्याल जरि तुह्मी धीर । होइऩल िस्थर मन ठायीं ॥2॥ तुका ह्मणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥3॥ 973 सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥1॥ वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥ आवडीच्या करा ऐसें। अंतर्वासें जाणतसां ॥2॥ तुका ह्मणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥3॥ 974 निर्धाराचें अवघें गोड । वाटे कोड कौतुक ॥1॥ बैसलिया भाव पांयीं । बरा तइप नाचेन ॥ध्रु.॥ स्वामी कळे सावधान। तरि मन उल्हासे ॥2॥ तुका ह्मणे आश्वासावें । प्रेम द्यावें विठ्ठले ॥3॥ 975 जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥1॥ नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥ पारुशला संवसार। मोडली बैसण्याची थार ॥2॥ आतां ह्मणे तुका । देवा अंतरें राखों नका ॥3॥ 976 आधार तो व्हावा । ऐसी आस करीं देवा ॥1॥ तुह्मांपाशीं काय उणें । काय वेचे समाधानें ॥ध्रु.॥ सेवेच्या अभिळासें। मन बहु जालें पिसें ॥2॥ अरे भHापराधीना । तुका ह्मणे नारायणा ॥3॥ 977 तुमचा तुह्मीं केला गोवा । आतां चुकवितां देवा ॥1॥ कैसें सरे चाळवणें । केलें काशाला शाहाणें ॥ध्रु.॥ कासया रूपा । नांवा आलेति गा बापा ॥2॥ तुका ह्मणे आतां । न सरे हवाले घालितां ॥3॥ 978 माझी भHी भोळी । एकविध भावबळी ॥1॥ मी कां पडेन निराळा । ऐसा सांडूनि सोहळा ॥ध्रु.॥ आतां अनारिसा । येथं न व्हावें सहसा ॥2॥ तुका ह्मणे जोडुनि पाय । पुढें उगा उभा राहें ॥3॥ 979 आहे तरिं सत्ता । ऐशा करितों वारता ॥1॥ अंगसंगाचीं उत्तरें । सलगीसेवेनें लेंकरें ॥ध्रु.॥ तरी निकटवासें । असों अशंकेच्या नासें ॥2॥ तुका ह्मणे रुची । येथें भिन्नता कैची ॥3॥ 980 काळ सारावा चिंतनें । एकांतवासीं गंगास्नानें । देवाचें पूजन । प्रदक्षणा तुळसीच्या ॥1॥ युH आहार वेहार । नेम इंिद्रयांचा सार । नसावी वासर । निद्रा बहु भाषण ॥ध्रु.॥ परमार्थ महाधन । जोडी देवाचे चरण । व्हावया जतन । हे उपाय लाभाचे ॥2॥ देह समपिऩजे देवा । भार कांहीं च न घ्यावा । होइऩल आघवा। तुका ह्मणे आनंद ॥3॥ 981 मऊ मेनाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥1॥ मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥ध्रु.॥ भले तरि देऊं गांडीची लंगोटी । नाठएाळा चि गांठीं देऊं माथां ॥2॥ मायबापाहूनि बहू मायावंत । करूं घातपात शत्रूहूनि ॥3॥ अमृत तें काय गोड आह्मांपुढें । विष तें बापुडें कडू किती ॥4॥ तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥5॥ 982 गाढवाचें तानें । पालटलें क्षणक्षणें ॥1॥ तैसे अधमाचे गुण । एकविध नाहीं मन ॥ध्रु.॥ उपजतां बरें दिसे । रूप वाढतां तें नासे ॥2॥ तुका ह्मणे भुंकते वेळे । वेळ अवेळ न कळे ॥3॥ 983 विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥1॥ गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुिद्ध करुनी ठेवा ॥ध्रु.॥ विचाराचें कांहीं करावें स्वहित । पापपुण्यांचीत भांडवल ॥2॥ तुका ह्मणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखें चि ॥3॥ 984 कल्पतरु रुया नव्हती बाभुळा । पुरविती फळा इिच्छतिया ॥1॥ उदंड त्या गाइऩ ह्मैसी आणि शेऑया । परि त्या निराऑया कामधेनु ॥2॥ तुका ह्मणे देव दाखवील दृष्टी । तया सवें भेटी थोर पुण्य ॥3॥ 985 जळो प्रेमा तैसा रंग । जाय भुलोनि पतंग ॥1॥ सासूसाटीं रडे सून । भाव अंतरींचा भिन्न ॥ध्रु.॥ मैंद मुखींचा कोंवळा। भाव अंतरीं निराळा ॥2॥ जैसी वृंदावनकांती । उत्तम धरूं ये हातीं ॥3॥ बक ध्यान धरी । सोंग करूनि मासे मारी ॥4॥ तुका ह्मणे सर्प डोले । तैसा कथेमाजी खुले ॥5॥ 986 वेशा नाहीं बोल अवगुण दूषीले । ऐशा बोला भले झणें क्षोभा ॥1॥ कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥ सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥2॥ याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें ही तें ॥3॥ तुका ह्मणे शूर तो चि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥4॥ 987 अणुरणीयां थोकडा । तुका आकाशाएवढा ॥1॥ गिळुनि सांडिलें किळवर । भव भ्रमाचा आकार ॥ध्रु.॥ सांडिली त्रिपुटी । दीप उजळला घटीं ॥2॥ तुका ह्मणे आतां । उरलों उपकारापुरता ॥3॥ 988 धन्य आजि दिन । जालें संताचें दर्शन ॥1॥ जाली पापातापा तुटी । दैन्य गेलें उठाउठीं ॥ध्रु.॥ जालें समाधान । पायीं विसांवले मन ॥2॥ तुका ह्मणे आले घरा । तो चि दिवाळीदसरा ॥3॥ 989 हें चि माझे धन । तुमचे वंदावे चरण ॥1॥ येणें भाग्यें असों जीत । एवढें समर्पूनी चित्त ॥ध्रु.॥ सांभािळलें देवा । मज अनाथा जी जीवा ॥2॥ जोडूनियां कर । तुका विनवितो किंकर ॥3॥ 990 फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥1॥ स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठ‍ हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥ निंदास्तुती कोणी करो दयामया । न धरीं चाड या सुखदुःखें ॥2॥ योगिराज कां रे न राहाती बैसोनी । एकिये आसनीं या चि गुणें ॥3॥ तुका ह्मणे मना पाहें विचारून । होइप रे कठिण वज्राऐसें ॥4॥ 991 जळो माझी ऐसी बुद्धी । मज घाली तुजमधीं । आवडे हे विधि । निषेधीं चि चांगली ॥1॥ तूं स्वामी मी सेवक । उंच पद निंच एक । ऐसें करावें कौतुक । नको करूं खंडणा ॥ध्रु.॥ जळ न खाती जळा । वृक्ष आपुलिया फळा । भोHा निराळा । तेणें गोडी निवडिली ॥2॥ हिरा शोभला कोंदणें । अळंकारीं मिरवे सोनें । एक असतां तेणें । काय दुजें जाणावें ॥3॥ उष्णें छाये सुख वाटे। बाळें माते पान्हा फुटे । एका एक भेटे । कोण सुख ते काळीं ॥4॥ तुका ह्मणे हित । हें चि मानी माझें चित्त । नव्हे आतां मुH । ऐसा जाला भरवसा ॥5॥ 992 मनीं वसे त्याचें आवडे उत्तर । वाटे समाचार घ्यावा ऐसें ॥1॥ जातीचें तें झुरे येर येरासाटीं । वियोगें ही तुटी नेघे कधीं ॥ध्रु.॥ भेटीची अपेक्षा वरता आदर । पुसे नव्हे धीर मागुतालें ॥2॥ तुका ह्मणे माझ्या जीवाचें जीवन । सोइरे हरिजन प्राणसखे ॥3॥ 993 नव्हे आराणूक परि मनीं वाहे । होइऩल त्या साहे पांडुरंग ॥1॥ पंढरीसि जावें उदेग मानसीं । धरिल्या पावसी संदेह नाहीं ॥ध्रु.॥ नसो बळ देह असो पराधीन । परि हें चिंतन टाकों नको ॥2॥ तुका ह्मणे देह पडो या चिंतनें । पुढें लागे येणें याजसाटीं ॥3॥ 994 कोठें देवा आलें अंगा थोरपण । बरें होतें दीन होतों तरीं ॥1॥ साधन ते सेवा संतांची उत्तम । आवडीनें नाम गाइऩन तें ॥ध्रु.॥ न पुसतें कोणी कोठें ही असतां । समाधान चित्ताचिया सुखें ॥2॥ तुका ह्मणे जन अव्हेरितें मज । तरी केशीराज सांभािळता ॥3॥ 995 चतुर मी जालों आपुल्या भोंवता । भावेंविण रिता काुंफ्ज अंगीं ॥1॥ आतां पुढें वांयां जावें हें तें काइऩ । कामक्रोधें ठायीं वास केला ॥ध्रु.॥ गुणदोष आले जगाचे अंतरा । भूताच्या मत्सरावरी बुिद्ध ॥2॥ तुका हमणे करूं उपदेश लोकां । नाहीं जालों एका परता दोषा ॥3॥ 996 धन्य ते संसारीं । दयावंत जे अंतरीं ॥1॥ येथें उपकारासाठीं । आले घर ज्यां वैकुंठीं ॥ध्रु.॥ लटिकें वचन । नाहीं देहीं उदासीन ॥2॥ मधुरा वाणी ओटीं । तुका ह्मणे वाव पोटीं ॥3॥ 997 कुटल्याविण नव्हे मांडा । अळसें धोंडा पडतसे ॥1॥ राग नको धरूं मनीं । गांडमणी सांगतों ॥ध्रु.॥ तरटापुढें बरें नाचे। सुतकाचें मुसळ ॥2॥ तुका ह्मणे काठी सार । करी फार शाहाणें ॥3॥ 998 कळों येतें तरि कां नव्हे । पडती गोवें भ्रमाचे ॥1॥ जाणतां चि होतो घात । परिसा मत देवा हें ॥ध्रु.॥ आंविसासाटीं फासा मान । पाडी धनइच्छा ते ॥2॥ तुका ह्मणे होणार खोटें । कर्म मोटें बिळवंत ॥3॥ 999 मोकळें मन रसाळ वाणी । या चि गुणीं संपन्न ॥1॥ लIमी ते ऐशा नावें । भाग्यें ज्यावें तरि त्यांनीं ॥ध्रु.॥ नमन नम्रता अंगीं । नेघे रंगीं पालट ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या नांवें । घेतां व्हावें संतोषी ॥3॥ 1000 शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ॥1॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुह्मांसी ॥ध्रु.॥ पुढें फार बोलों काइऩ । अवघें पायीं विदित ॥2॥ तुका ह्मणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥3॥ 1001 करितों कवित्व ह्मणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1॥ माझिये युHीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥ काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥ निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥ तुका ह्मणे आहें पाइऩक चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4॥ 1002 आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं न ह्मणावें । ऐसें तंव आह्मां सांगितलें नाहीं देवें ॥1॥ ह्मणा रामराम टाळी वाजवा हातें। नाचा डोला प्रेमें आपुलिया स्वहितें ॥ध्रु.॥ सहज घडे तया आळस करणें तें काइऩ । अग्नीचें भातुकें हात पािळतां कां पायीं ॥2॥ येथें नाहीं लाज भिHभाव लौकिक । हांसे तया घडे ब्रह्महत्यापातक ॥3॥ जया जैसा भाव निरोपण करावा । येथें नाहीं चाड ताळविताळ या देवा ॥4॥ सदैव ज्यां कथा काळ घडे श्रवण । तुका ह्मणे येर जन्मा आले पाषाण ॥5॥ 1003 देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥1॥ देव न लगे देव न लगे । सांटवणेचे रुधले जागे ॥ध्रु.॥ देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करूं ॥2॥ देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल कांहीं ॥3॥ दुबळा तुका भावेंविणें । उधारा देव घेतला रुणें ॥4॥ 1004 विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥1॥ साधनें संकटें सर्वांलागीं सीण । व्हावा लागे क्षीण अहंमान ॥ध्रु.॥ भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥2॥ तुका ह्मणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥3॥ 1005 कीर्तनाची गोडी । देव निवडी आपण ॥1॥ कोणी व्हा रे अधिकारी । त्यासी हरि देइऩल ॥ध्रु.॥ वैराग्याचे बळें । साही खळ जिणावे ॥2॥ उरेल ना उरी । तुका करी बोभाट ॥3॥ 1006 कायावाचामन ठेविलें गाहाण । घेतलें तुझें रिण जोडीलागीं ॥1॥ अवघें आलें आंत पोटा पडिलें थीतें । सारूनि नििंश्चत जालों देवा ॥ध्रु.॥ द्यावयासी आतां नाहीं तोळा मासा । आधील मवेशा तुज ठावी ॥2॥ तुझ्या रिणें गेले बहुत बांधोन । जाले मजहून थोरथोर ॥3॥ तुका ह्मणे तुझे खतीं जें गुंतलें । करूनि आपुलें घेइप देवा ॥4॥ 1007 करिसी कीं न करिसी माझा अंगीकार । हा मज विचार पडिला देवा ॥1॥ देसी कीं न देसी पायांचें दर्शन । ह्मणऊनि मन िस्थर नाहीं ॥ध्रु.॥ बोलसी कीं न बोलसी मजसवें देवा । ह्मणोनियां जीवा भय वाटे ॥2॥ होइऩल कीं न होय तुज माझा आठव। पडिला संदेह हा चि मज ॥3॥ तुका ह्मणे मी कमाइऩचे हीण। ह्मणऊनि सीण करीं देवा ॥4॥ 1008 ऐसा माझा आहे भीडभार । नांवाचा मी फार वांयां गेलों ॥1॥ काय सेवा रुजु आहे सत्ताबळ । तें मज राउळ कृपा करी ॥ध्रु.॥ काय याती शुद्ध आहे कुळ कर्म । तेणें पडे वर्म तुझे ठायीं ॥2॥ कोण तपोनिध दानधर्मसीळ । अंगीं एक बळ आहे सत्ता ॥3॥ तुका ह्मणे वांयां जालों भूमी भार । होइऩल विचार काय नेणों ॥4॥ 1009 साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥1॥ करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥ शुद्ध माझा भाव होइल तुझे पायीं । तरि च हें देइप निवडूनि ॥2॥ उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥4॥ 1010 नाहीं कंटाळलों परि वाटे भय । करावें तें काय न कळतां ॥1॥ जन वन आह्मां समान चि जालें । कामक्रोध गेले पावटणी ॥ध्रु.॥ षडऊर्मी शत्रु जिंतिले अनंता । नामाचिया सत्ताबळें तुझ्या ॥2॥ ह्मणऊनिं मुख्य धर्म आह्मां सेवकांचा ऐसा । स्वामी करी शिरसा पाळावें तें ॥3॥ ह्मणऊनिं तुका अवलोकुनी पाय । वचनाची पाहे वास एका ॥4॥ 1011 वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥1॥ नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥ शब्दYाानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥2॥ जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥3॥ तुका ह्मणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥4॥ 1012 न कळे तkवYाान मूढ माझी मती । परि ध्यातों चित्तीं चरणकमळ ॥1॥ आगमाचे भेद मी काय जाणें । काळ तो चिंतनें सारीतसें ॥ध्रु.॥ कांहीं नेणें परि ह्मणवितों दास । होइल त्याचा त्यास अभिमान ॥2॥ संसाराची सोय सांडिला मारग । दुराविलें जग एका घायें ॥3॥ मागिल्या लागाचें केलेंसे खंडण । एकाएकीं मन राखियेलें ॥4॥ तुका ह्मणे अगा रखुमादेवीवरा । भHकरुणाकरा सांभाळावें ॥5॥ 1013 इतुलें करीं देवा ऐकें हें वचन । समूळ अभिमान जाळीं माझा ॥1॥ इतुलें करीं देवा ऐकें हे गोष्टी । सर्व समदृष्टी तुज देखें ॥ध्रु.॥ इतुलें करीं देवा विनवितों तुज । संतांचे चरणरज वंदीं माथां ॥2॥ इतुलें करीं देवा ऐकें हे मात । हृदयीं पंढरीनाथ दिवसरात्रीं ॥3॥ भलतिया भावें तारीं पंढरीनाथा । तुका ह्मणे आतां शरण आलों ॥4॥ 1014 तुझा दास ऐसा ह्मणती लोकपाळ । ह्मणऊनि सांभाळ करीं माझा ॥1॥ अनाथाचा नाथ पतितपावन । हें आतां जतन करीं नाम ॥ध्रु.॥ माझें गुण दोष पाहातां न लगे अंत । ऐसें माझें चित्त मज ग्वाही ॥2॥ नेणें तुझी कैसी करावी हे सेवा । जाणसी तूं देवा अंतरींचें ॥3॥ तुका ह्मणे तूं या कृपेचा सिंधु । तोडीं भवबंधु माझा देवा ॥4॥ 1015 जाणावें ते काय नेणावें ते काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥1॥ करावें तें काय न करावें तें काय । ध्यावें तुझे पाय हें चि सार ॥ध्रु.॥ बोलावें तें काय न बोलावें तें काय । ध्यावे तुझे पाय हें चि सार ॥2॥ जावें तें कोठें न वजावे आतां । बरवें आठवितां नाम तुझें ॥3॥ तुका ह्मणे तूं करिसी तें सोपे । पुण्यें होती पापें आमुच्या मतें ॥4॥ 1016 नको ब्रह्मYाान आत्मिस्थतिभाव । मी भH तूं देव ऐसें करीं ॥1॥ दावीं रूप मज गोपिकारमणा । ठेवीन चरणांवरी माथा ॥ध्रु.॥ पाहोनि श्रीमुख देइन आलिंगन । जीवें निंबलोण उतरीन ॥2॥ पुसतां सांगेन हितगुज मात । बैसोनि एकांत सुखगोष्टी ॥3॥ तुका ह्मणे यासी न लावीं उशीर । माझें अभ्यंतर जाणोनियां ॥4॥ 1017 मागें शरणागत तारिले बहुत । ह्मणती दीनानाथ तुज देवा ॥1॥ पाहिले अपराध नाहीं याती कुळ । तारिला अजामेळ गणिका भिल्ली ॥ध्रु.॥ अढळपदीं बाळ बैसविला धुरु । क्षीराचा सागरु उपमन्ये ॥2॥ गजेंद्रपशु नाडियें जळचरें । भवसिंधुपार उतरिला ॥3॥ प्रल्हाद अग्नींत राखिला जळांत । विषाचें अमृत तुझ्या नामें ॥4॥ पांडवां संकट पडतां जडभारी । त्यांचा तू कैवारी नारायणा ॥5॥ तुका ह्मणे तूं या अनाथाचा नाथ । ऐकोनियां मात शरण आलों ॥6॥ 1018 तुझा शरणागत जालों मी अंकित । करीं माझें हित पांडुरंगा ॥1॥ पतितपावन तुझी ब्रीदावळी । ते आतां सांभाळीं मायबापा ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ बोलतील संत ऐकोनियां मात विश्वासलों ॥2॥ न करावी निरास न धरावें उदास । देइप याचकास कृपादान ॥3॥ तुका ह्मणे मी तों पातकांची रासी । देइप पायापासीं ठाव देवा ॥4॥ 1019 सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अिग्न जैसा ॥1॥ सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥ घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मिस्थति तया अंगीं वसे ॥2॥ नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वताौनि तो जनीं जनादऩन ॥3॥ तुका ह्मणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥4॥ 1020 कुळधर्म Yाान कुळधर्म साधन । कुळधर्में निधान हातीं चढे ॥1॥ कुळधर्म भिH कुळधर्म गति । कुळधर्म विश्रांति पाववील ॥ध्रु.॥ कुळधर्म दया कुळधर्म उपकार । कुळधर्म सार साधनाचें ॥2॥ कुळधर्म महkव कुळधर्म मान । कुळधर्म पावन परलोकींचें ॥3॥ तुका ह्मणे कुळधर्म दावी देवीं देव । यथाविध भाव जरीं होय ॥4॥ 1021 पुण्य परउपकार पाप ते परपीडा । आणीक नाहीं जोडा दुजा यासी ॥1॥ सत्य तो चि धर्म असत्य तें कर्म । आणीक हे वर्म नाहीं दुजें ॥ध्रु.॥ गति ते चि मुखीं नामाचें स्मरण । अधोगति जाण विन्मुखते ॥2॥ संतांचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ॥3॥ तुका ह्मणे उघडें आहे हित घात । जयाचें उचित करा तैसें ॥4॥ 1022 न वजे वांयां कांहीं ऐकतां हरिकथा । आपण करितां वांयां न वजे ॥1॥ न वजे वांयां कांहीं देवळासी जातां । देवासी पूजितां वांयां न वजे ॥ध्रु.॥ न वजे वांयां कांहीं केलिया तीर्थ । अथवा कां व्रत वांयां न वजे ॥2॥ न वजे वांयां जालें संतांचें दर्शन । शुद्ध आचरण वांयां न वजे ॥3॥ तुका ह्मणे भाव असतां नसतां । सायास करितां वांयां न वजे ॥4॥ 1023 चित्तीं धरीन मी पाउलें सकुमारें । सकळ बिढार संपत्तीचें ॥1॥ कंठीं धरिन मी नाम अमृताची वल्ली । होइऩल राहिली शीतळ तनु ॥ध्रु.॥ पाहेन श्रीमुख साजिरें सुंदर । सकळां अगर लावण्यांचें ॥2॥ करिन अंगसंग बाळकाचे परी । बैसेन तों वरी नुतरीं कडिये ॥3॥ तुका ह्मणे हा केला तैसा होय । धरिली मनें सोय विठोबाची ॥4॥ 1024 बाळ मातेपाशीं सांगे तानभूक । उपायाचें दुःख काय जाणे ॥1॥ तयापरी करीं पाळण हें माझें । घेउनियां ओझें सकळ भार ॥ध्रु.॥ कासया गुणदोष आणिसील मना । सर्व नारायणा अपराधी ॥2॥ सेवाहीन दीन पातकांची रासी । आतां विचारिसी काय ऐसें ॥3॥ जेणें काळें पायीं अनुसरलें चित्त । निर्धार हें हित जालें ऐसें ॥4॥ तुका ह्मणे तुह्मी तारिलें बहुतां । माझी कांहीं चिंता असों दे वो ॥5॥ 1025 जीवनावांचूनि तळमळी मासा । प्रकार हा तैसा होतो जीवा ॥1॥ न संपडे जालें भूमिगत धन । चरफडी मन तयापरी ॥ध्रु.॥ मातेचा वियोग जालियां हो बाळा । तो कळवळा जाणा देवा ॥2॥ सांगावे ते किती तुह्मांसी प्रकार । सकळांचें सार पाय दावीं ॥3॥ ये चि चिंते माझा करपला भीतर । कां नेणों विसर पडिला माझा ॥4॥ तुका ह्मणे तूं हें जाणसी सकळ । यावरि कृपाळ होइप देवा ॥5॥ 1026 शरण आलें त्यासी न दावीं हे पाठी । ऐका जगजेठी विYाापना ॥1॥ अळविती तयांसी उत्तर झडकरी । द्यावें परिसा हरी विYाापना ॥ध्रु.॥ गांजिलियाचें करावें धांवणें । विनंती नारायणें परिसावी हे ॥2॥ भागलियाचा होइप रे विसांवा । परिसावी केशवा विYाापना ॥3॥ अंकिताचा भार वागवावा माथां । परिसावी अनंता विYाापना ॥4॥ तुका ह्मणे आह्मां विसरावें ना देवा । परिसावी हे देवा विYाापना ॥5॥ 1027 कोण आह्मां पुसे सिणलें भागलें । तुजविण उगलें पांडुरंगा ॥1॥ कोणापाशीं आह्मीं सांगावें सुखदुःख । कोण तानभूक निवारील ॥ध्रु.॥ कोण या तापाचा करील परिहार । उतरील पार कोण दुजा ॥2॥ कोणापें इच्छेचें मागावें भातुकें । कोण कवतुकें बुझावील ॥3॥ कोणावरी आह्मीं करावी हे सत्ता । होइल साहाता कोण दुजा ॥4॥ तुका ह्मणे अगा स्वामी सर्व जाणां । दंडवत चरणां तुमच्या देवा ॥5॥ 1028 तेव्हां धालें पोट बैसलों पंगती । आतां आह्मां मुिHपांग काइऩ ॥1॥ धांवा केला आतां होइऩल धांवणे । तया कायी करणें लागे सध्या ॥ध्रु.॥ गायनाचा आतां कोठें उरला काळ। आनंदें सकळ भरी आलें ॥2॥ देवाच्या सख्यत्वें विषमासी ठाव । मध्यें कोठें वाव राहों सके ॥3॥ तेव्हां जाली अवघी बाधा वाताहात। प्रेम हृदयांत प्रवेशलें ॥4॥ तुका ह्मणे आह्मीं जिंतिलें भरवसा । देव कोठें दासा मोकलितो ॥5॥ 1029 तरि कां पवाडे गर्जती पुराणें । असता नारायण शिHहीन ॥1॥ कीर्तीविण नाहीं नामाचा डांगोरा । येर कां इतरां वाणीत ना ॥ध्रु.॥ तरि च ह्मणा तो आहे चिरंजीव । केलियाचा जीव सुखीं गुण ॥2॥ चांगलेपण हें निरुपायता अंगीं । बाणलें श्रीरंगा ह्मणऊनि ॥3॥ तरि च हा थोर सांगितलें करी । अभिमान हरीपाशीं नाहीं ॥4॥ तुका ह्मणे तरि करिती याची सेवा । देवापाशीं हेवा नाहीं कुडें ॥5॥ 1030 अविट हें क्षीर हरिकथा माउली । सेविती सेविली वैष्णवजनीं ॥1॥ अमृत राहिलें लाजोनि माघारें । येणें रसें थोरें ब्रह्मानंदे ॥ध्रु.॥ पतित पातकी पावनपंगती । चतुर्भुज होती देवाऐसे ॥2॥ सर्व सुखें तया मोहोरती ठाया । जेथें दाटणी या वैष्णवांची ॥3॥ निर्गुण हें सोंग धरिलें गुणवंत । धरूनियां प्रीत गाये नाचे ॥4॥ तुका ह्मणे केलीं साधनें गाळणी । सुलभ कीर्तनीं होऊनी ठेला ॥5॥ 1031 संसारसोहळे भोगितां सकळ । भHां त्याचें बळ विटोबाचें ॥1॥ भय चिंता धाक न मनिती मनीं । भHां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥ पापपुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भHांसी श्रीरंग सर्वभावे ॥2॥ नव्हती ते मुH आवडे संसार । देव भHां भार सर्व वाहे ॥3॥ तुका ह्मणे देव भHां वेळाइऩत । भH ते नििंश्चत त्याचियानें ॥4॥ 1032 देवासी अवतार भHांसी संसार । दोहींचा विचार एकपणें ॥1॥ भHांसी सोहळे देवाचिया अंगें । देव त्यांच्या संगें सुख भोगी ॥ध्रु.॥ देवें भHां रूप दिलासे आकार । भHीं त्याचा पार वाखाणिला ॥2॥ एका अंगीं दोन्ही जालीं हीं निर्माण । देवभHपण स्वामिसेवा ॥3॥ तुका ह्मणे येथें नाहीं भिन्नभाव । भH तो चि देव देव भH ॥4॥ 1033 हुंबरती गाये तयांकडे कान । कैवल्यनिधान देउनि ठाके ॥1॥ गोपाळांची पूजा उिच्छष्ट कवळी । तेणें वनमाळी सुखावला ॥ध्रु.॥ चोरोनियां खाये दुध दहीं लोणी । भावें चक्रपाणि गोविला तो ॥2॥ निष्काम तो जाला कामासी लंपट । गोपिकांची वाट पाहात बैसे ॥3॥ जगदानी इच्छी तुळसीएकदळ । भावाचा सकळ विकिला तो ॥4॥ तुका ह्मणे हें चि चैतन्यें सावळें । व्यापुनि निराळें राहिलेंसे ॥5॥ 1034 समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥1॥ आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार तेथें वाढी ॥ध्रु.॥ न ह्मणे सोइरा सुहुदऩ आवश्यक । राजा आणि रंक सारिखा चि ॥3॥ भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥3॥ कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥4॥ तुका ह्मणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवें ॥5॥ 1035 आले भरा केणें । येरझार चुके जेणें ॥1॥ उभें केलें विटेवरी । पेंठ इनाम पंढरी ॥ध्रु.॥ वाहाती मारग । अवघें मोहोरलें जग ॥2॥ तुका ह्मणे माप । खरें आणा माझे बाप ॥3॥ 1036 लIमीवल्लभा । दिनानाथा पद्मनाभा ॥1॥ सुख वसे तुझे पायीं । मज ठेवीं ते चि ठायीं ॥ध्रु.॥ माझी अल्प हे वासना। तूं तो उदाराचा राणा ॥2॥ तुका ह्मणे भोगें । पीडा केली धांव वेगें ॥3॥ 1037 करीं ऐसें जागें । वेळोवेळां पायां लागें ॥1॥ प्रेम झोंबो कंठीं । देह धरणिये लोटीं ॥ध्रु.॥ राहे लोकाचार पडे अवघा विसर ॥2॥ तुका ह्मणे ध्यावें । तुज विभीचारभावें ॥3॥ 1038 टाळ दिडी हातीं । वैकुंठींचे सांगाती ॥1॥ जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥ जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥2॥ तुका ह्मणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥3॥ 1039 वांयां जातों देवा । नेणें भHी करूं सेवा ॥1॥ आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥ करावें तें काय। न कळें अवलोकितों पाय ॥2॥ तुका ह्मणे दान । दिलें पदरीं घेइऩन ॥3॥ 1040 जीव खादला देवत । माझा येणें महाभूतें । झोंबलें निरुतें । कांहीं करितां न सुटे ॥1॥ आतां करूं काय । न चले करितां उपाय । तुह्मां आह्मां सय । विघडाविघड केली ॥ध्रु.॥ बोलतां दुिश्चती । मी वो पडियेलें भ्रांती । आठव हा चित्तीं । न ये ह्मणतां मी माझें ॥2॥ भलतें चि चावळे । जना अवघिया वेगळे । नाठवती बाळें । आपपर सारिखें ॥3॥ नका बोलों सये । मज वचन न साहे। बैसाल त्या राहें । उग्या वाचा खुंटोनी ॥4॥ तुह्मां आह्मां भेटी । नाहीं जाली जीवेंसाटीं । तुका ह्मणे दृष्टी । पाहा जवळी आहे तों ॥5॥ 1041 जींवीचा जिव्हाळा । पाहों आपुलिया डोळां ॥1॥ आह्मां विठ्ठल एक देव । येर अवघे चि वाव ॥ध्रु.॥ पुंडलिकाचे पाठीं। उभा हात ठेवुनि कटी ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं । वाहूं रखुमाइऩचा पती ॥3॥ 1042 माझें आराधन । पंढरपुरींचें निधान ॥1॥ तया एकाविण दुजें । कांहीं नेणें पंढरीराजें ॥ध्रु.॥ दास विठ्ठलाचा । अंकित अंकिला ठायींचा ॥2॥ तुका ह्मणे आतां । नव्हे पालट सर्वथा ॥3॥ 1043 आतां आह्मां हें चि काम । न विसंभावें तुझें नाम । वाहुनियां टाळी । प्रेमसुखें नाचावें ॥1॥ अवघी जाली आराणूक । मागें पुढें सकिळक । त्रिपुटीचें दुःख । प्रारब्ध सारिलें ॥ध्रु.॥ गोदातटें निर्मळें । देव देवांचीं देवळें । संत महंत मेळें । दिवस जाय सुखाचा ॥2॥ तुका ह्मणे पंढरीनाथा । आणिक नाहीं मज चिंता । योगक्षेम माथां । भार तुझ्या घातला ॥3॥ 1044 चोरटें सुनें मारिलें टाळे । केंउं करी परि न संडी चाळे ॥1॥ ऐसें एक दुराचारी गा देवा । आपुलिया जीवा घात करी ॥ध्रु.॥ नाक गेलें तरि लाज ना विचार । हिंडे फजितखोर दारोदारीं ॥2॥ तुका ह्मणे कर्म बिळवंत गाढें । नेदी तया पुढेंमागें सरों ॥3॥ 1045 मुनि मुH जाले भेणें गर्भवासा । आह्मां विष्णुदासां सुलभ तो ॥1॥ अवघा चि संसार केला ब्रह्मरूप । विठ्ठलस्वरूप ह्मणोनियां ॥ध्रु.॥ पुराणीं उपदेश साधन उद्भट । आह्मां सोपी वाट वैकुंठींची ॥2॥ तुका ह्मणे जनां सकळांसहित । घेऊं अखंडित प्रेमसुख ॥2॥ 1046 न करावी स्तुति माझी संतजनीं । होइऩल या वचनीं अभिमान ॥1॥ भारें भवनदी नुतरवे पार । दुरावती दूर तुमचे पाय ॥2॥ तुका ह्मणे गर्व पुरवील पाठी । होइऩल माझ्या तुटी विठोबाची ॥3॥ 1047 तुमचिये दासींचा दास करूनि ठेवा । आशीर्वाद द्यावा हा चि मज ॥1॥ नवविधा काय बोलिली जे भHी । घ्यावी माझ्या हातीं संतजनीं ॥2॥ तुका ह्मणे तुमच्या पायांच्या आधारें। उत्तरेन खरें भवनदी ॥3॥ 1048 चोर टेंकाचे निघाले चोरी । आपलें तैसें पारखे घरीं ॥1॥ नाहीं नफा नागवे आपण । गमाविले कान हात पाय ॥ध्रु.॥ बुिद्धहीन नये कांहीं चि कारणा । तयासवें जाणा तें चि सुख ॥2॥ तुका ह्मणे नाहीं ठाउकें वर्म । तयासी कर्म वोडवलें ॥3॥ 1049 समर्थाचें बाळ कीविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥1॥ अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥2॥ तुका ह्मणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥3॥ 1050 गाढवाचे अंगीं चंदनाची उटी । राख तया तेणें केलीसे भेटी ॥1॥ सहज गुण जयाचे देहीं । पालट कांहीं नव्हे तया ॥ध्रु.॥ माकडाचे गळां मोलाचा मणि । घातला चावुनी टाकी थुंकोनि ॥2॥ तुका ह्मणे खळा नावडे हित । अविद्या वाढवी आपुलें मत ॥3॥ 1051 नेणे सुनें चोर पाहुणा मागता । देखून भलता भुंकतसे ॥1॥ शिकविलें कांहीं न चले तया । बोलियेले वांयां बोल जाती ॥ध्रु.॥ क्षीर ओकुनियां खाय अमंगळ । आपुली ते ढाळ जाऊं नेदी ॥2॥ वंदूं निंदूं काय दुराचार । खळाचा विचार तुका ह्मणे ॥3॥ 1052 जन मानविलें वरी बाहएात्कारीं । तैसा मी अंतरीं नाहीं जालों ॥1॥ ह्मणउनी पंढरीनाथा वाटतसे चिंता । प्रगट बोलतां लाज वाटे ॥ध्रु.॥ संतां ब्रह्मरूप जालें अवघें जन । ते माझे अवगुण न देखती ॥2॥ तुका ह्मणे मी तों आपणांसी ठावा । आहें बरा देवा जैसा तैसा ॥3॥ 1053 काम क्रोध माझे जीताती शरीरीं । कोवळें तें वरी बोलतसें ॥1॥ कैसा सरतां जालों तुझ्या पायीं । पांडुरंगा कांहीं न कळे हें ॥ध्रु.॥ पुराणींची ग्वाही वदतील संत । तैसें नाहीं चित्त शुद्ध जालें ॥2॥ तुका ह्मणे मज आणूनि अनुभवा । दाखवीं हें देवा साच खरें ॥3॥ 1054 स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥1॥ तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥ रामकृष्णहरि मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥2॥ तुका ह्मणे तुमचें सेवितों उिच्छष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥3॥ 1055 बहु दूरवरी । वेठी ओझें होतें शिरीं ॥1॥ आतां उतरला भार । तुह्मीं केला अंगीकार ॥ध्रु.॥ बहु काकुलती । आलों मागें किती ॥2॥ तुका ह्मणे देवा । आजि सफळ जाली सेवा ॥3॥ पाइऩक - अभंग 11 1056 पाइऩकपणें जोतिला सिद्धांत । सुर धरी मात वचन चित्तीं ॥1॥ पाइकावांचून नव्हे कधीं सुख । प्रजांमध्यें दुःख न सरे पीडा ॥ध्रु.॥ तरि व्हावें पाइऩक जिवाचा उदार । सकळ त्यांचा भार स्वामी वाहे ॥2॥ पाइकीचें सुख जयां नाहीं ठावें । धिग त्यांनीं ज्यावें वांयांविण ॥3॥ तुका ह्मणे एका क्षणांचा करार । पाइऩक अपार सुख भोगी ॥4॥ 1057 पाइकीचें सुख पाइकासी ठावें । ह्मणोनियां जीवें केली साटीं ॥1॥ येतां गोऑया बाण साहिले भडमार । वर्षातां अपार वृिष्ट वरी ॥ध्रु.॥ स्वामीपुढें व्हावें पडतां भांडण । मग त्या मंडन शोभा दावी ॥2॥ पाइकांनीं सुख भोगिलें अपार । शुद्ध आणि धीर अंतर्बाहीं ॥3॥ तुका ह्मणे या सिद्धांताच्या खुणा । जाणे तो शाहाणा करी तो भोगी ॥4॥ 1058 पाइऩक जो जाणे पाइकींनीं भाव । लाग पगें ठाव चोरवाट ॥1॥ आपणां राखोनि ठकावें आणीक । घ्यावें सकळीक हरूनियां ॥ध्रु.॥ येऊं नेदी लाग लागों नेदी माग । पाइऩक त्या जग स्वामी मानी ॥2॥ ऐसें जन केलें पाइकें पाइऩक । जया कोणी भीक न घलिती ॥3॥ तुका ह्मणे ऐसे जयाचे पाइऩक । बिळया तो नाइक त्रैलोकींचा ॥4॥ 1059 पाइकांनीं पंथ चालविल्या वाटा । पारख्याचा सांटा मोडोनियां ॥1॥ पारखिये ठायीं घेउनियां खाणें । आपलें तें जन राखियेलें ॥ध्रु.॥ आधारेंविण जें बोलतां चावळे । आपलें तें कळे नव्हे ऐसें ॥2॥ सांडितां मारग मारिती पाइऩक । आणिकांसी शीक लागावया ॥3॥ तुका ह्मणे विश्वा घेऊनि विश्वास । पाइऩक तयास सुख देती ॥4॥ 1060 पाइऩक तो प्रजा राखोनियां कुळ । पारखिया मूळ छेदी दुष्टा ॥1॥ तो एक पाइऩक पाइकां नाइऩक । भाव सकळीक स्वामिकाजीं ॥ध्रु.॥ तृणवत तनु सोनें ज्या पाषाण । पाइका त्या भिन्न नाहीं स्वामी ॥2॥ विश्वासावांचूनि पाइकासी मोल । नाहीं मिथ्या बोल बोलिलिया ॥3॥ तुका ह्मणे नये स्वामी उणेपण । पाइका जतन करी त्यासी ॥4॥ 1061 धनी ज्या पाइका मानितो आपण । तया भितें जन सकळीक ॥1॥ जिवाचे उदार शोभती पाइऩक । मिरवती नाइऩक मुगुटमणि ॥ध्रु.॥ आपुलिया सत्ता स्वामीचें वैभव । भोगिती गौरव सकळ सुख ॥2॥ कमाइचीं हीणें पडिलीं उदंडें । नाहीं तयां खंड येती जाती ॥3॥ तुका ह्मणे तरि पाइकी च भली । थोडीबहुत केली स्वामिसेवा ॥4॥ 1062 पाइकपणें खरा मुशारा । पाइऩक तो खरा पाइकीनें ॥1॥ पाइऩक जाणें मारितें अंग । पाइकासी भंग नाहीं तया ॥ध्रु.॥ एके दोहीं घरीं घेतलें खाणें । पाइऩक तो पणें निवडला ॥2॥ करूनि कारण स्वामी यश द्यावें । पाइका त्या नांव खरेपण ॥3॥ तुका ह्मणे ठाव पाइकां निराळा । नाहीं स्वामी स्थळा गेल्याविण ॥4॥ 1063 उंच निंच कैसी पाइकाची वोळी । कोण गांढे बळी निवडिले ॥1॥ स्वामिकाजीं एक सर्वस्वें तत्पर । एक ते कुचर आशाबद्ध ॥ध्रु.॥ प्रसंगावांचूनि आणिती आयुर्भाव । पाइऩक तो नांव मिरवी वांयां ॥2॥ गणतीचे एक उंच निंच फार । तयांमध्यें शूर विरळा थोडे ॥3॥ तुका ह्मणे स्वामी जाणे त्यांचा मान । पाइऩक पाहोन मोल करी ॥4॥ 1064 एका च स्वामीचे पाइऩक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥1॥ स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥ हीन कमाइऩचा हीन आन ठाव । उंचा सर्व भाव उंच पद ॥2॥ पाइकपणें तो सर्वत्र सरता । चांग तरी परता गांढएा ठाव ॥3॥ तुका ह्मणे मरण आहे या सकळां । भेणें अवकळा अभयें मोल ॥4॥ 1065 प्रजी तो पाइऩक ओळीचा नाइऩक । पोटासाटीं एकें जैशीं तैशीं ॥1॥ आगळें पाऊल आणिकांसी तरी । पळती माघारीं तोडिजेती ॥ध्रु.॥ पाठीवरी घाय ह्मणती फटमर । धडा अंग शूर मान पावे ॥2॥ घेइऩल दरवडा देहा तो पाइऩक । मारी सकळीक सर्व हरी ॥3॥ तुका ह्मणे नव्हे बोलाचें कारण । कमाइऩचा पण सिद्धी पावे ॥4॥ 1066 जातीचा पाइऩक ओळखे पाइका । आदर तो एका त्याचे ठायीं ॥1॥ धरितील पोटासाटीं हतियेरें । कळती तीं खरें वेठीचींसीं ॥ध्रु.॥ जीताचें तें असे खरें घायडाय । पारखिया काय पाशीं लोपे ॥2॥ तुका ह्मणे नमूं देव ह्मुण जना । जालियांच्या खुणा जाणतसों ॥3॥ ॥11॥ 1067 बुद्धीचा पालट धरा रे कांहीं । मागुता नाहीं मनुष्यदेह ॥1॥ आपुल्या हिताचे नव्हती सायास । गृहदाराआसधनवित्त ॥ध्रु.॥ अवचितें निधान लागलें हें हातीं । भोगावी विपत्ती गर्भवास ॥2॥ यावें जावें पुढें ऐसें चि कारण । भोगावें पतन नरकवास ॥3॥ तुका ह्मणे धरीं आठव या देहीं । नाहींतरि कांहीं बरें नव्हे ॥4॥ 1068 आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें । तुह्मां लागे कोडें उगवणें ॥1॥ आचरतां दोष न धरूं सांभाळ । निवाड उकल तुह्मां हातीं ॥ध्रु.॥ न घेतां कवडी करावा कुढावा । पाचारितां देवा नामासाठीं ॥2॥ दयासिंधु नाम पतितपावन । हें आह्मां वचन सांपडलें ॥3॥ तुका ह्मणे करूं अन्यायाच्या कोटी । कृपावंत पोटीं तूं चि देवा ॥4॥ 1069 जो भHांचा विसावा । उभा पाचारितो धांवा ॥1॥ हातीं प्रेमाचें भातुकें । मुखीं घाली कवतुकें । भवसिंधू सुखें । उतरी कासे लावूनि ॥ध्रु.॥ थोर भHांची आस । पाहे भोंवताली वास ॥2॥ तुका ह्मणे कृपादानी । फेडी आवडीची धणी ॥3॥ 1070 अखंड तुझी जया प्रीति । मज दे त्यांची संगति । मग मी कमळापति । तुज नानीं कांटाळा ॥1॥ पडोन राहेन ते ठायीं । उगा चि संतांचिये पायीं । न मगें न करीं कांहीं । तुझी आण विठोबा ॥ध्रु.॥ तुह्मी आह्मी पीडों ज्यानें । दोन्ही वारती एकानें । बैसलों धरणें । हाका देत दारेशीं ॥2॥ तुका ह्मणे या बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला । न पाहिजे केला । अवघा माझा आव्हेर ॥3॥ 1071 पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥1॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचिया रासी । पाप नाहीं ओखदासी ॥2॥ तुका ह्मणे त्यांनीं । केली वैकुंठ मेदिनी ॥3॥ 1072 जन देव तरी पायां चि पडावें । त्याचिया स्वभावें चाड नाहीं ॥1॥ अग्नीचें सौजन्य शीतनिवारण । पालवीं बांधोनि नेतां नये ॥2॥ तुका ह्मणे विंचु सर्प नारायण । वंदावे दुरोन शिवों नये ॥3॥ 1073 भH भागवत जीवन्मुH संत । महिमा अत्यद्भुत चराचरीं। ऐसिया अनंतामाजी तूं अनंत । लीलावेश होत जगत्राता ॥1॥ ब्रह्मानंद तुकें तुळे आला तुका । तो हा विश्वसंख्या क्रीडे जनीं ॥ध्रु.॥ शास्त्रा श्रेष्ठाचार अविरुद्ध क्रिया । तुझी भHराया देखियेली । देऊनि तिळाजुळी काम्य निषिद्धांसी । विधिविण योगेशी ब्रह्मार्पण ॥2॥ संत ग्रहमेळीं जगधंद्या गिळी । पैल उदयाचळीं भानु तुका । संत वृंदें तीर्थ गौतमी हरिकथा । तुकया नर सिंहस्ता भेटों आली ॥3॥ शांति पतिव्रते जाले परिनयन । काम संतर्पण निष्कामता। क्षमा क्षमापणें प्रसिद्ध प्रथा जगीं । तें तों तुझ्या अंगी मूतिऩमंत ॥4॥ दया दिनानाथा तुवा जीवविली । विश्वीं विस्तारली कीतिऩ तुझी । वेदवाक्यबाहु उभारिला ध्वज । पूजिले देव द्विज सर्वभूतें ॥5॥ अधर्म क्षयव्याधि धर्मांशीं स्पर्शला । तो त्वां उपचारिला अनन्यभिH। ब्रह्म ऐक्यभावें भिH विस्तारिली । वाक्यें सपळ केलीं वेदविहितें ॥6॥ देहबुिद्ध जात्या अभिमानें वंचलों । तो मी उपेिक्षलों न पाहिजे। न घडो याचे पायीं बुद्धीचा व्यभिचार । मागे रामेश्वर रामचंद्र ॥7॥ 1074 भूत भविष्य कळों यावें वर्तमान । हें तों भाग्यहीन त्यांची जोडी ॥1॥ आह्मीं विष्णुदासीं देव ध्यावा चित्तें । होणार तें होतें प्रारब्धें ॥ध्रु.॥ जगरूढीसाटीं घातलें दुकान । जातो नारायण अंतरोनि ॥2॥ तुका ह्मणे हा हो प्रपंच गाढा । थोरली ते पीडा रििद्धसिद्धी ॥3॥ ॥घोंगडएाचे अभंग-॥12॥ 1075 ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥1॥ पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥2 ॥ तुका ह्मणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥3॥ 1076 घोंगडियांचा पालट केला । मुलांमुलां आपुल्यांत ॥1॥ कान्होबा तो मी च दिसें । लाविलें पिसें संवगडियां ॥ध्रु.॥ तो बोले मी उगाच बैसें । आनारिसें न दिसे ॥2॥ तुका ह्मणे दिलें सोंग । नेदी वेंग जाऊं देऊं ॥3॥ 1077 खेळों लागलों सुरकवडी । माझी घोंगडी हारपली ॥1॥ कान्होबाचे पडिलों गळां । घेइप गोपाळा देइप झाडा ॥ध्रु.॥ मी तों हागे उघडा जालों । अवघ्या आलों बाहेरी ॥2॥ तुका ह्मणे बुिद्ध काची । नाहीं ठायींची मजपाशीं ॥3॥ 1078 घोंगडियांची एकी राशी । त्याचपाशीं तें ही होतें ॥1॥ माझियाचा माग दावा । केला गोवा उगवों द्या ॥ध्रु.॥ व्हावें ऐसें निसंतान । घेइन आन तुजपाशीं ॥2॥ तुका ह्मणे लाहाण मोठा । सांड ताठा हा देवा ॥3॥ 1079 नाहीं तुझे उगा पडत गळां । पुढें गोपाळा जाऊं नको ॥1॥ चाहाड तुझे दाविन घरीं । बोलण्या उरी नाहीं ऐसी ॥ध्रु.॥ तुह्मां आह्मां पडदा होता । सरला आतां सरोबरी ॥2॥ तुका ह्मणे उरती गोठी । पडिली मिठी न सुटे ॥3॥ 1080 तुह्मां आह्मां उरी तोंवरी । जनाचारी ऐसें तैसी ॥1॥ माझें घोंगडें टाकुन देइप । एके ठायीं मग असों ॥ध्रु.॥ विरोधानें पडे तुटी । कपट पोटीं नसावें ॥2॥ तुका ह्मणे तूं जाणता हरी । मज वेव्हारीं बोलविसी ॥3॥ 1081 मुळींचा तुह्मां लागला चाळा । तो गोपाळा न संडा ॥1॥ घ्यावें त्याचें देणें चि नाहीं । ये चि वाहिं देखतसों ॥ध्रु.॥ माझी तरी घोंगडी मोठी । गांडीची लंगोटी सोडिस ना ॥2॥ तुका ह्मणे म्यां सांडिली आशा । हुंगिला फांसा येथुनियां ॥3॥ 1082 घोंगडियास घातली मिठी । न सोडी साटी केली जीवें ॥1॥ हा गे चोर धरा धांवा कोणी । घरांत राहाटे चहूं कोणी ॥ध्रु.॥ नोळखवे म्यां धरिला हातीं । देहएादिप माय लाविली वाती ॥2॥ न पावे धांवणें मारितो हाका । जनाचारीं तुका नागवला ॥3॥ 1083 आतां मी देवा पांघरों काइऩ । भिकेचें तें ही उरे चि ना ॥1॥ सदैव दुबळें नेणें चोर । देखोनि सुनाट फोडितो घर ॥ध्रु.॥ नाहीं मजपाशीं फुटकी फोडी । पांचांनीं घोंगडी दिली होती ॥2॥ तुका ह्मणे जना वेगळें जालें । एक चि नेलें एकल्याचें ॥3॥ 1084 मी माझें करित होतों जतन । भीतरिल्या चोरें घेतलें खानें ॥1॥ मज आल्याविण आधीं च होता । मज न कळतां मज माजी ॥ध्रु.॥ घोंगडें नेलें घोंगडें नेलें । उघडें केलें उघडें चि ॥2॥ तुका ह्मणे चोरटा चि जाला साव । सहज चि न्याय नाहीं तेथें ॥3॥ 1085 घोंगडें नेलें सांगों मी कोणा । दुबळें माझें नाणीत मना ॥1॥ पुढें तें मज न मिळे आतां । जवळी सत्ता दाम नाहीं ॥ध्रु.॥ सेटे महाजन ऐका कोणी । घोंगडियाची करा शोधणी ॥2॥ घोंगडियाचा करा बोभाट । तुका ह्मणे जंव भरला हाट ॥3॥ 1086 माझें घोंगडें पडिलें ठायीं । माग तया पायीं सांपडला ॥1॥ चोर तो भला चोर तो भला । पाठिसी घातला पुंडलिकें ॥ध्रु.॥ चोर कुठोरि एके चि ठायीं । वेगळें पाहावें नलगेच कांहीं ॥2॥ आणिकांचीं ही चोरलीं आधीं । माझें तयामधीं मेळविलें ॥3॥ आपल्या आपण शोधिलें तींहीं । करीन मी ही ते चि परी ॥4॥ तुका ह्मणे माझें हित चि जालें । फाटकें जाउन धडकें चि आलें ॥5॥ ॥12॥ 1087 सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे। हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥1॥ तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडीं आतां । माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा तुज न करितां ॥ध्रु.॥ आविसें मिनु लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणउनियां । काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥2॥ पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें । मरण नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्व ना जालीं बाळें ॥3॥ गोडपणें मासी गुंतली लिगाडीं । सांपडे फडफडी अधिकाअधिक । तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥4॥ 1088 यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥1॥ काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥ द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जयामधीं होता गांठी ॥2॥ तुका ह्मणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥3॥ 1089 शीतळ साउली आमुची माउली । विठाइऩ वोळली प्रेमपान्हा ॥1॥ जाऊनि वोसंगा वोरस । लागलें तें इच्छे पीइन वरी ॥ध्रु.॥ कृपा तनु माझा सांभाळी दुभूनि । अमृतजीवनी लोटलीसे ॥2॥ आनंदाचा ठाव नाहीं माझा चित्तीं । सागर तो किती उपमेसी ॥3॥ सैर जाये पडे तयेसी सांकडें । सांभाळीत पुढें मागें आस ॥4॥ तुका ह्मणे चिंता कैसी ते मी नेणें । लडिवाळ तान्हें विठाइऩचें ॥5॥ रामचरित्र - अभंग ॥14॥ 1090 रामा वनवास । तेणें वसे सर्व देश ॥1॥ केलें नामाचें जतन । समर्थ तो नव्हे भिन्न ॥ध्रु.॥ वनांतरीं रडे । ऐसे पुराणीं पवाडे ॥2॥ तुका ह्मणें ॠषिनेम । ऐसा कळोनि कां भ्रम ॥3॥ 1091 राम ह्मणे ग्रासोग्रासीं । तो चि जेविला उपवासी ॥1॥ धन्यधन्य तें शरीर । तीर्थांव्रतांचे माहेर ॥ध्रु.॥ राम ह्मणे करितां धंदा । सुखसमाधि त्या सदा ॥2॥ राम ह्मणे वाटे चाली । यYा पाउलापाउलीं ॥3॥ राम ह्मणें भोगीं त्यागीं । कर्म न लिंपे त्या अंगीं ॥4॥ ऐसा राम जपे नित्य । तुका ह्मणे जीवन्मुH ॥5॥ 1092 तारी ऐसे जड । उदकावरी जो दगड ॥1॥ तो हा न करी तें काइऩ । कां रे लीन नव्हां पायीं ॥ध्रु.॥ सीळा मनुष्य जाली। ज्याच्या चरणाचे चाली ॥2॥ वानरां हातीं लंका । घेवविली ह्मणे तुका ॥3॥ 1093 राम ह्मणतां राम चि होइजे । पदीं बैसोन पदवी घेइजे ॥1॥ ऐसें सुख वचनीं आहे । विश्वासें अनुभव पाहें ॥ध्रु.॥ रामरसाचिया चवी । आन रस रुचती केवीं ॥2॥ तुका ह्मणे चाखोनि सांगें । मज अनुभव आहे अंगें ॥3॥ 1094 रामराम उत्तम अक्षरें । कंठीं धरिलीं आपण शंकरें ॥1॥ कैसीं तारक उत्तम तिहीं लोकां । हळाहळ शीतळ केलें शिवा देखा ॥ध्रु.॥ हा चि मंत्र उपदेश भवानी । तिच्या चुकल्या गर्भादियोनि ॥2॥ जुन्हाट नागर नीच नवें । तुका ह्मणें म्यां धरिलें जीवें भावें ॥3॥ 1095 राम ह्मणतां तरे जाणता अणतां । हो का यातिभलता कुळहीन ॥1॥ राम ह्मणतां न लगे आणीक सायास । केले महा दोष तेही जळती ॥ध्रु.॥ राम ह्मणे तया जवळी नये भूत । कैचा यमदूत ह्मणतां राम ॥2॥ राम म्हणतां तरे भवसिंधुपार । चुके वेरझार म्हणतां राम ॥3॥ तुका ह्मणें हें सुखाचें हें साधन । सेवीं अमृतपान एका भावें ॥4॥ 1096 पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति ॥1॥ अवघें लंकेमाजी जाले रामाचे दूत । व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत ॥ध्रु.॥ अवघे अंगलग तुझे वधियेले वीर । होइऩ शरणागत किंवा युद्धासी सादर ॥2॥ तुका म्हणे ऐक्या भावें रामेसी भेटी । करूनि घेइऩ आतां संवंघेसी तुटी ॥3॥ 1097 समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥1॥ कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥2॥ तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥3॥ 1098 केला रावणाचा वध । अवघा तोडिला संबंध ॥1॥ लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ॥ध्रु.॥ उदार्याची सीमा । काय वणूप रघुरामा ॥2॥ तुका ह्मणे माझा दाता । रामें सोडविली सीता ॥3॥ 1099 रामरूप केली । रामें कौसल्या माउली ॥1॥ राम राहिला मानसीं । ध्यानीं चिंतनीं जयासी । राम होय त्यासी । संदेह नाहीं हा भरवसा ॥ध्रु.॥ अयोध्येचे लोक । राम जाले सकळीक ॥2॥ स्मरतां जानकी । रामरूप जाले कपि ॥3॥ रावणेसी लंका। राम आपण जाला देखा ॥4॥ ऐसा नित्य राम ध्याय । तुका वंदी त्याचे पाय ॥5॥ 1100 आनंदले लोक नरनारी परिवार । शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ॥1॥ आनंद जाला अयोध्येसी आले रघुनाथ । अवघा जेजेकार आळंगिला भरत ॥ध्रु.॥ करिती अक्षवाणें ओंवािळती रघुवीरा । लIमीसहित लIमण दुसरा ॥2॥ जालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका ह्मणे गाइऩवत्सें नरनारीबाळें ॥3॥ 1101 जालें रामराज्य काय उणें आम्हांसी । धरणी धरी पीक गाइऩ वोळल्या ह्मैसी ॥1॥ राम वेळोवेळां आम्ही गाऊं ओविये। दिळतां कांडितां जेवितां गे बाइये ॥ध्रु.॥ स्वप्नीं ही दुःख कोणी न देखे डोळां । नामाच्या गजरें भय सुटलें काळा ॥2॥ तुका ह्मणे रामें सुख दिलें आपुलें । तयां गर्भवासीं येणें जाणें खुंटलें ॥3॥ 1102 अहल्या जेणें तारिली रामें । गणिका परलोका नेली नामें ॥1॥ रामहरे रघुराजहरे । रामहरे महाराजहरे ॥ध्रु.॥ कंठ शीतळ जपतां शूळपाणी । राम जपतां अविनाश भवाणी ॥2॥ तारकमंत्रश्रवण काशी । नाम जपतां वाल्मीक ॠषि ॥3॥ नाम जपें बीज मंत्र नळा । सिंधु तरती ज्याच्या प्रतापें शिळा ॥4॥ नामजप जीवन मुनिजना ॥ तुकयास्वामी रघुनंदना ॥5॥ 1103 मी तों अल्प मतिहीन । काय वणूप तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें ॥1॥ नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें । कपिकुळ उद्धरिलें । मुH केलें राक्षसां ॥ध्रु.॥ द्रोणागिरि कपिहातीं । आणविला सीतापती । थोर केली ख्याति । भरतभेटीसमयीं ॥2॥ शिळा होती मनुष्य जाली । थोर कीतिऩ वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशानें ॥3॥ राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ॥4॥ ॥14॥ श्लोकरूपी अभंग - ॥6॥ 1104 तुजवाचुनी मागणें काय कोणा । महीमंडळीं विश्वव्यापकजना । जीवभावना पुरवूं कोण जाणे । तुजवांचुनी होत कां रावराणे ॥1॥ नसे मोक्षदाता तिहींमाजि लोकां । भवतारकु तूजवांचुनि एका । मनीं मानसीं चिंतितां रूपनाम । पळे पाप ताप भयें नास काम ॥2॥ हरी नाम हें साच तुझें पुराणीं । हरीहातिचें काळगर्भादियोनी । करूं मुखवाणी कैसी देशघडी । तुजवांचुनि वाणितां व्यर्थ गोडी ॥3॥ भवभंजना व्यापक लोक तिन्ही । तुज वाणितां श्रमला शेषफणी । असो भावें जीव तुझ्या सर्व पायीं । दुजें मागणें आणीक व्यर्थ काइप ॥4॥ दिनानाथ हे साक्ष तूझी जनासी । दिनें तारिलीं पातकी थोर दोषी । तुका राहिला पायिं तो राख देव। असें मागतसे तुझी चरणसेवा ॥5॥ 1105 उभा भींवरेच्या तिरी राहिलाहे । असे सन्मुख दिक्षणे मूख वाहे । महापातकांसी पळ कांप थोर । कैसे गर्जती घोष हे नामवीर ॥1॥ गुणगंभीर हा धीर हास्यमुख । वदे वदनीं अमृत सर्वसुख । लागलें मुनिवरां गोड चित्तीं । देहभावना तुटलियासि खंती ॥2॥ ठसा घातला ये भूमिमाजी थोर । इच्छादाना हा द्यावयासी उदार । जया वोळगती सििद्ध सर्वठायीं । तुझें नाम हें चांगलें गे विठाइऩ ॥3॥ असे उघडा हा विटेवरि उभा । कटसूत्र हें धरुनि भिHलोभा । पुढें वाट दावी भवसागराची । विठो माउली हे सिद्धसाधकांची ॥4॥ करा वेगु हा धरा पंथ आधीं । जया पार नाहीं सुखा तें च साधीं । म्हणे तुका पंढरीस सर्व आलें । असे विश्व हें जीवनें त्याचि ज्यालें ॥5॥ 1106 धना गुंतलें चित्त माझें मुरारी । मन घेउनी हिंडवी दारोदारीं । मरे हिंडतां न पुरे यासि कांहीं । मही ठेंगणी परी तें तृप्त नाहीं ॥1॥ न दिसे शुद्ध पाहातां निजमती । पुढें पडिलों इंिद्रयां थोर घातीं । जिवा नास त्या संगती दंड बेडी । हरी शीघ्र या दुष्टसंगासि तोडीं ॥2॥ असीं आणिकें काय सांगों अनंता । मोहो पापिणी दुष्टमायाममता । क्रोध काम यातना थोर करी । तुजवांचुनी सोडवी कोण हरी ॥3॥ निज देखतां निज हे दूरि जाये । निद्रा आळस दंभ यी भीत आहे । तयां विस्त देहीं नको देउं देवा । तुजवांचुनी आणिक नािस्त हेवा ॥4॥ करीं घात पात शंका लाज थोरी । असे सत्य भाव बहू भिH दूरी । नको मोकलूं दीनबंधु अनाथा । तुका वीनवी ठेवुनी पायिं माथा ॥5॥ 1107 पैल सांवळें तेज पुंजाळ कैसें । सिरीं तुबिऩलीं साजिरीं मोरवीसें । हरे त्यासि रे देखतां ताप माया । भजा रे भजा यादव योगिराया ॥1॥ जया कामिनी लुब्धल्या सहस्रसोळा । सुकुमार या गोपिका दिव्य बाळा । शोभे मध्यभागीं कळा चंद्रकोटी । रुपा मीनली साजिरी माळकंठीं ॥2॥ असे यादवां श्रेष्ठ हा चक्रपाणी । जया वंदिती कोटि तेहतीस तीन्ही । महाकाळ हे कांपती दैत्य ज्यासी । पाहा सांवळें रूप हें पापनासी ॥3॥ कसीं पाउलें साजिरीं कुंकुमाचीं। कसी वीट हे लाधली दैवांची। जया चिंतितां अिग्न हा शांति नीवे। धरा मानसीं आपला देहभाव ॥4॥ मुनी देखतां मूख हें चित्त ध्याय। देह मांडला भाव हा बापमाय। तुक्या लागलें मानसीं देवपीसें । चित्त चोरटें सांवळें रूप कैसें ॥5॥ 1108 असे नांदतु हा हरी सर्वजीवीं । असे व्यापुनी अिग्न हा काष्ठ तेवीं । घटीं बिंबलें बिंब हें ठायिठायीं । तया संगती नासु हा त्यासि नाहीं ॥1॥ तन वाटितां क्षीर हें होत नाहीं । पशू भिक्षतां पालटे तें चि देहीं । तया वर्म तो जाणता एक आहे । असे व्यापक व्यापुनी अंतर्बाहे ॥2॥ फळ कदऩळीं सेवटीं येत आहे । असे शोधितां पोकळीमाजि काये । धीर नाहीं त्यें वाउगें धीग जालें । फळ पुष्पना यत्न व्यर्थ गेले ॥3॥ असे नाम हें दर्पणें सिद्ध केलें। असे बिंब तें या मळा आहे ठेलें । कैसें शुद्ध नाहीं दिसे माजिरूप। नका वाढवूं सीण हा पुण्यपाप ॥4॥ करा वर्म ठावें नका सोंग वांयां। तुका वीनवीतो पडों काय पायां । तुज पुत्र दारा धन वासना हे । मग ऊरलें शेवटीं काय पाहें ॥5॥ 1109 मना सांडिं हे वासना दुष्ट खोडी । मती मानसीं एक हे व्यर्थ गोडी । असे हीत माझें तुज कांहीं एक । धरीं विठ्ठलीं प्रेम हें पायिं सूख ॥1॥ ऐसा सर्वभावें तुज शरण आलों । देहदुःख हें भोगितां फार भ्यालों । भवतारितें दूसरें नाहिं कोणी । गुरु होत कां देव तेहतीस तीन्ही ॥2॥ जना वासना हे धना थोरि आहे । तुज लागली संगती ते चि सोये । करीं सर्व संगी परि त्यागु ठायीं । तुका विनवीतो मस्तक ठेवुनि पायीं ॥3॥ ॥6॥ 1110 सुटायाचा कांहीं पाहातों उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥1॥ ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुिद्ध बळ माझें ॥ध्रु.॥ प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥2॥ विधिनिषेधाचे सांपडलों चपे । एकें एक लोपे निवडेना ॥3॥ सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥4॥ तुका ह्मणे आतां करीं सोडवण । सर्वशिHहीन जालों देवा ॥5॥ 1111 भय वाटे पर । न सुटे हा संसार ॥1॥ ऐसा पडिलों कांचणी । करीं धांवा ह्मणउनी ॥ध्रु.॥ विचारितों कांहीं । तों हें मन हातीं नाहीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । येथें न पुरे रिघावा ॥3॥ 1112 येगा येगा पांडुरंगा । घेइऩ उचलुनि वोसंगा ॥1॥ ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥ उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥2॥ तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥3॥ तुका ह्मणे हृषीकेशी । काय उशीर लाविसी ॥4॥ 1113 माझी विठ्ठल माउली । प्रेमें पान्हा पान्हायेली ॥1॥ कृवाळूनि लावी स्तनीं । न वजे दुरी जवळूनि ॥ध्रु.॥ केली पुरवी आळी । नव्हे निष्ठ‍ कोंवळी ॥2॥ तुका ह्मणे घांस । मुखीं घाली ब्रह्मरस ॥3॥ 1114 आह्मी उतराइऩ । भाव निरोपूनि पायीं ॥1॥ तुह्मी पुरवावी आळी । करावी ते लडिवाळीं ॥ध्रु.॥ आमचा हा नेम । तुह्मां उचित हा धर्म ॥2॥ तुका ह्मणे देवा । जाणों सांगितली सेवा ॥3॥ 1115 केलें पाप जेणें दिलें आन्मोदन । दोघांसी पतन सारिके चि ॥1॥ विष नवनीता विष करी संगें । दुर्जनाच्या त्यागें सर्व हित ॥ध्रु.॥ देखिलें ओढाळ निघालिया सेता । टाळावें निमित्या थैक ह्मुण ॥2॥ तुका ह्मणे जोडे केल्याविण कर्म । देखतां तो श्रम न मानितां ॥3॥ 1116 विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥1॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥ विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुिप्त । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥2॥ भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥3॥ तुका ह्मणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥4॥ 1117 दास जालों हरिदासांचा । बुिद्धकायामनेंवाचा ॥1॥ तेथें प्रेमाचा सुकाळ । टाळमृदंगकल्लोळ । नासे दुष्टबुिद्ध सकळ । समाधि हरिकीर्त्तनीं ॥ध्रु.॥ ऐकतां हरिकथा । भिH लागे त्या अभHां ॥2॥ देखोनि कीर्तनाचा रंग । कैसा उभा पांडुरंग ॥3॥ हें सुख ब्रह्मादिकां । ह्मणे नाहीं नाहीं तुका ॥4॥ 1118 गति अधोगति मनाची युिH । मन लावीं एकांतीं साधुसंगें ॥1॥ जतन करा जतन करा । धांवतें सैरा ओढाळ तें ॥ध्रु.॥ मान अपमान मनाचें लक्षण । लाविलिया ध्यान तें चि करी ॥2॥ तुका ह्मणे मन उतरी भवसिंधु । मन करी बंधु चौ†याशीचा ॥3॥ 1119 पंढरीस दुःख न मिळे ओखदा । प्रेमसुख सदा सर्वकाळ ॥1॥ पुंडलिकें हाट भरियेली पेंठ । अवघें वैकुंठ आणियेलें ॥ध्रु.॥ उदमासी तुटी नाहीं कोणा हानि । घेऊनियां धणी लाभ घेती ॥2॥ पुरलें देशासी भरलें सिगेसी । अवघी पंचक्रोशी दुमदुमीत ॥3॥ तुका ह्मणे संतां लागलीसे धणी । बैसले राहोनि पंढरीस ॥4॥ 1120 द्वारकेचें केणें आलें या चि ठाया । पुढें भHराया चोजवीत ॥1॥ गोविलें विसारें माप केलें खरें । न पाहे माघारें अद्यापवरी ॥ध्रु.॥ वैष्णव मापार नाहीं जाली सळे । पुढें ही न कळे पार त्याचा ॥2॥ लाभ जाला त्यांनीं धरिला तो विचार । आहिक्य परत्र सांटविलें ॥3॥ तुका ह्मणे मज मिळाली मजुरी । विश्वास या घरीं संतांचिया ॥4॥ 1121 सुरवर येती तीथॉ नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥1॥ साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥ पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥2॥ निविऩषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥3॥ तुका ह्मणे ज्यापें नाहीं पुष्पलेश । जा रे पंढरीस घेइप कोटि ॥4॥ 1122 विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे Yाान पाठी भार लगड तैसा ॥1॥ वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥ सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥2॥ नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका ह्मणे काय मुद्रासोंग जािळसी ॥3॥ 1123 देव होसी तरी आणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥1॥ दुष्ट होसी तरी अणिकांतें करिसी । संदेह येविशीं करणें न लगे ॥2॥ तुका ह्मणे जें दर्पणीं बिंबलें । तें तया बाणलें निश्चयेसीं ॥3॥ 1124 कलिधर्म मागें सांगितले संतीं । आचार सांडिती द्विजलोक ॥1॥ ते चि कळों आतां येतसे प्रचिती । अधर्मा टेंकती धर्म नव्हे ॥ध्रु.॥ तप व्रत करितां लागती सायास । पािळतां पिंडास गोड वाटे ॥2॥ देव ह्मणऊनी न येती देऊळा । संसारा वेगळा तरी कां नव्हे ॥3॥ तुका ह्मणे मज धरितां गुमान । ऐसे कोणी जन नरका जाती ॥4॥ 1125 नमो विष्णुविश्वरूपा मायबापा । अपरा अमुपा पांडुरंगा ॥1॥ विनवितों रंक दास मी सेवक । वचन तें एक आइकावें ॥ध्रु.॥ तुझी स्तुति वेद करितां भागला । निवांत चि ठेला नेति नेति ॥2॥ ॠषि मुनि बहु सिद्ध कविजन । वणिऩतां ते गुण न सरती ॥3॥ तुका ह्मणे तेथें काय माझी वाणी । जे तुझी वाखाणी कीर्ती देवा ॥4॥ 1126 अंतरीचा भाव जाणोनिया गुज । तैसे केले काज पांडुरंगा ॥1॥ घातले वचन न पडेचि खाली । तू आह्मा माउली अनाथांची ॥ध्रु.॥ मज याचकाची पुरवावी आशा । पंढरीनिवासा मायबापा ॥2॥ नाशिली आशंका माझिया जीवाची । उरली भेदाची होती काही ॥3॥ तुका ह्मणे आतां केलो मी निर्भर । गाईन अपार गुण तुझे ॥4॥ 1127 उदार कृपाळ अनाथांचा नाथ । ऐकसी मात शरणागतां ॥1॥ सर्व भार माथां चालविसी त्यांचा । अनुसरलीं वाचा काया मनें ॥ध्रु.॥ पाचारितां उभा राहासी जवळी । पाहिजे ते काळीं पुरवावें ॥2॥ चालतां ही पंथ सांभाळिसी वाटे । वारिसील कांटे खडे हातें ॥3॥ तुका ह्मणे चिंता नाहीं तुझ्या दासां । तूं त्यांचा कोंवसा सर्वभावें ॥4॥ 1128 काय कीर्ती करूं लोक दंभ मान । दाखवीं चरण तुझे मज ॥1॥ मज आतां ऐसें नको करूं देवा । तुझा दास जावा वांयां विण ॥ध्रु.॥ होइल थोरपण जाणीवेचा भार । दुरावेन दूर तुझा पायीं ॥2॥ अंतरींचा भाव काय कळे लोकां । एक मानी एकां देखोवेखीं ॥3॥ तुका ह्मणे तुझे पाय आतुडती । ते मज विपित्त गोड देवा ॥4॥ 1129 मानावया जग व्हावी द्रव्यमाया । नाहीं ते माझिया जीवा चाड ॥1॥ तुझ्या पायांसाठीं केली आराणूक । आतां कांहीं एक नको दुजें ॥ध्रु.॥ करूनियां कृपा करीं अंगीकार । न लवीं उसीर आतां देवा ॥2॥ नव्हे साच कांहीं कळों आलें मना । ह्मणोनि वासना आवरिली ॥3॥ तुका ह्मणे आतां मनोरथ सिद्धी। माझे कृपानिधी पाववावे ॥4॥ 1130 आतां माझा सर्वभावें हा निर्धार । न करीं विचार आणिकांसी ॥1॥ सर्वभावें नाम गाइऩन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥ध्रु.॥ लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहीन भरोनि डोळे मुख ॥2॥ निर्लज्ज होऊनि नाचेन रंगणीं । येऊं नेदी मनीं शंका कांहीं ॥3॥ अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका ह्मणे ॥4॥ 1131 जनीं जनादऩन ऐकतों हे मात । कैसा तो वृत्तांत न कळे आह्मां ॥1॥ जन्म जरा मरण कवण भोगी भोग । व्याधि नाना रोग सुखदुःखें ॥ध्रु.॥ पापपुण्यें शुद्धाशुद्ध आचरणें । हीं कोणांकारणें कवणें केलीं ॥2॥ आह्मां मरण नाश तूं तंव अविनाश । कैसा हा विश्वास साच मानूं ॥3॥ तुका ह्मणे तूं चि निवडीं हा गुढार । दाखवीं साचार तें चि मज ॥4॥ 1132 यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥1॥ चोरा धरितां सांगे कुठो†याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥2॥ तुका ह्मणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥3॥ 1133 धीर तो कारण साहे होतो नारायण । नेदी होऊं सीण वाहों चिंता दासांसी ॥1॥ सुखें करावें कीर्तन हषॉ गावे हरिचे गुण। वारी सुदर्शन आपण चि किळकाळ ॥ध्रु.॥ जीव वेची माता बाळा जडभारी होतां । तो तों नव्हे दाता प्राकृतां यां सारिखा ॥2॥ हें तों माझ्या अनुभवें अनुभवा आलें जीवें । तुका ह्मणे सत्य व्हावें आहाच नये कारणा ॥3॥ 1134 पुढें आतां कैंचा जन्म । ऐसा श्रम वारेसा ॥1॥ सर्वथाही फिरों नये । ऐसी सोय लागलिया ॥ध्रु.॥ पांडुरंगा ऐसी नाव । तारूं भाव असतां ॥2॥ तुका ह्मणे चुकती बापा । पुन्हा खेपा सकळा ॥3॥ 1135 दुद दहीं ताक पशूचें पाळण । त्यांमध्यें कारण घृतसार ॥1॥ हें चि वर्म आह्मां भाविकांचे हातीं । ह्मणऊनि चित्तीं धरिला राम ॥ध्रु.॥ लोहो कफ गारा अग्नीचिया काजें । ये†हवी तें ओझें कोण वाहे ॥2॥ तुका ह्मणे खोरीं पाहारा जतन । जोंवरि हें धन हातीं लागे ॥3॥ 1136 वीर विठ्ठलाचे गाढे । किळकाळ पायां पडे ॥1॥ करिती घोष जेजेकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥ क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥2॥ तुका ह्मणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥3॥ 1137 ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या खुणा । पंढरीचा राणा मनामाजी स्मरावा ॥1॥ मग कैचें रे बंधन वाचे गातां नारायण। भवसिंधु तो जाण ये चि तीरी सरेल ॥ध्रु.॥ दास्य करील किळकाळ बंद तुटेल मायाजाळ । होतील सकळ रििद्धसिद्धी ह्मणियारीं ॥2॥ सकळशास्त्रांचें सार हें वेदांचें गव्हर । पाहातां विचार हा चि करिती पुराणें ॥3॥ ब्राह्मण क्षेत्री वैश्य शूद्र चांडाळां आहे अधिकार । बाळें नारीनर आदि करोनि वेश्या ही ॥4॥ तुका ह्मणे अनुभवें आह्मीं पाडियलें ठावें । आणीक ही दैवें सुख घेती भाविकें ॥5॥ 1138 न करीं तळमळ राहें रे निश्चळ । आहे हा कृपाळ स्वामी माझा ॥1॥ अविनाश सुख देइऩल निर्वाणी । चुकतील खाणी चौ†याशीच्या ॥ध्रु.॥ आणिकिया जीवां होइऩल उद्धार । ते ही उपकार घडती कोटि ॥2॥ आहिक्य परत्रीं होसील सरता । उच्चारीं रे वाचा रामराम ॥3॥ तुका ह्मणे सांडीं संसाराचा छंद । मग परमानंद पावसील ॥4॥ 1139 कां रे दास होसी संसाराचा खर । दुःखाचे डोंगर भोगावया ॥1॥ मिष्टान्नाची गोडी जिव्हेच्या अगरीं । मसक भरल्यावरी स्वाद नेणे ॥ध्रु.॥ आणीक ही भोग आणिकां इंिद्रयांचे। नाहीं ऐसे साचे जवळी कांहीं ॥2॥ रूप दृिष्ट धाय पाहातां पाहातां। न घडे सर्वथा आणि तृष्णा ॥3॥ तुका ह्मणे कां रे नाशिवंतासाटीं। देवासवें तुटी करितोसी ॥4॥ 1140 बैसोनि निश्चळ करीं त्याचें ध्यान । देइऩल तो अन्नवस्त्रदाता ॥1॥ काय आह्मां करणें अधिक सांचुनी । देव जाला ॠणी पुरविता ॥ध्रु.॥ दयाळ मयाळ जाणे कळवळा । शरणागतां लळा राखों जाणे ॥2॥ न लगे मागणें सांगणें तयासी। जाणे इच्छा तैसी पुरवी त्याची ॥3॥ तुका ह्मणे लेइप अळंकार अंगीं । विठ्ठल हा जगीं तूं चि होसी ॥4॥ 1141 सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥1॥ काय करावें प्रमाण । तुह्मी सांगा संतजन ॥ध्रु.॥ मृित्तकेचा घट । माजी अमृताचा सांट ॥2॥ तुका ह्मणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥3॥ सेतावर - अभंग 3 1142 सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥1॥ नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं ह्मणियारा । सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥ जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥2॥ कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥3॥ Yाानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥4॥ बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥5॥ नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागो†याच्या नेटें ॥6॥ पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥7॥ सराये सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥8॥ प्रेम पिकलें अपार । नाहीं सांटवावया थार ॥9॥ ऐसीये जोडी जो चुकला । तुका ह्मणे धिग त्याला ॥10॥ 1143 वोनव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥1॥ तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥ चोरासवें वाट ॥ चालोनि केलें तळपट ॥ 2॥ डोळे झांकुनि राती ॥ कूर्पी पडे दिवसा जोती ॥3॥ पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥4॥ फुटकी सांगडी । तुका ह्मणे न पवे थडी ॥5॥ 1144 सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥1॥ सोंकरीं सोंकरीं विसावा तों वरा । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥ गोफणेसी गुंडा घालीं पागो†याच्या नेटें। पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥2॥ पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मान बळ बुिद्ध व्हावीं दोनी ॥3॥ खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्याचे भाग देइप त्यासी ॥4॥ तुका ह्मणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥5॥ ॥3॥ 1145 नका घालूं दुध जयामध्यें सार । ताकाचे उपकार तरी करा ॥1॥ नेदा तरी हें हो नका देऊं अन्न । फुकाचें जीवन तरी पाजा ॥2॥ तुका ह्मणे मज सगुणाची चाड । पुरवा कोणी कोड दुर्बळाचें ॥3॥ उतराधिपदें - 22 1146 क्या गाऊं कोइऩ सुननवाला । देखें तों सब जग ही भुला ॥1॥ खेलों आपणे राम इसातें । जैसी वैसी करहों मात ॥ध्रु.॥ काहांसे ल्यावों माधर वाणी । रीझे ऐसी लोक बिराणी ॥2॥ गिरिधर लाल तो भावहि भुका । राग कला नहिं जानत तुका ॥3॥ 1147 छोडे धन मंदिर बन बसाया । मांगत टूका घरघर खाया ॥1॥ तीनसों हम करवों सलाम । ज्या मुखें बैठा राजाराम ॥ध्रु.॥ तुलसीमाला बभूत च†हावे । हरजीके गुण निर्मल गावे ॥2॥ कहे तुका जो साइप हमारा । हिरनकश्यप उन्हें मारहि डारा ॥3॥ 1148 मंत्रयंत्र नहिं मानत साखी । प्रेमभाव नहिं अंतर राखी ॥1॥ राम कहे त्याके पगहूं लागूं । देखत कपट अमिमान दुर भागूं ॥ध्रु.॥ अधिक याती कुलहीन नहिं ज्यानु । ज्याणे नारायन सो प्राणी मानूं ॥2॥ कहे तुका जीव तन डारू वारी । राम उपासिंहु बलियारी ॥3॥ 1149 चुराचुराकर माखन खाया । गौळणीका नंद कुमर कन्हया ॥1॥ काहे बडाइऩ दिखावत मोहि । जाणत हुं प्रभुपणा तेरा खव हि ॥ध्रु.॥ और बात सुन उखळसुं गळा । बांधलिया आपना तूं गोपाळा ॥2॥ फेरत वनबन गाऊ धरावतें । कहे तुकयाबंधु लकरी लेले हात ॥3॥ 1150 हरिसुं मिल दे एक हि बेर । पाछे तूं फिर नावे घर ॥1॥ मात सुनो दुति आवे मनावन । जाया करति भर जोबन ॥ध्रु.॥ हरिसुख मोहि कहिया न जाये । तव तूं बुझे आगोपाये ॥2॥ देखहि भाव कछु पकरि हात । मिलाइ तुका प्रभुसात ॥3॥ 1151 क्या कहुं नहीं बुझत लोका । लिजावे जम मारत धका ॥1॥ क्या जीवनेकी पकडी आस । हातों लिया नहिं तेरा घांस ॥ध्रु.॥ किसे दिवाने कहता मेरा । कछु जावे तन तूं सब ल्या न्यारा ॥2॥ कहे तुका तूं भया दिवाना । आपना विचार कर ले जाना ॥3॥ 1152 कब मरूं पाऊं चरन तुम्हारे । ठाकुर मेरे जीवन प्यारे ॥1॥ जग रडे ज्याकुं सो मोहि मीठा । मीठा दर आनंदमाहि पैठा ॥ध्रु.॥ भला पाऊं जनम इऩhहे बेर । बस मायाके असंग फेर ॥2॥ कहे तुका धन मानहि दारा । वोहिलिये गुंडलीयें पसारा ॥3॥ 1153 दासों पाछें दौरे राम । सोवे खडा आपें मुकाम ॥1॥ प्रेमरसडी बांधी गळे । खैंच चले उधर ॥ध्रु.॥ आपणे जनसु भुल न देवे । कर हि धर आघें बाट बसावे ॥2॥ तुका प्रभु दीनदयाला। वारि रे तुज पर हुं गोपाला ॥3॥ 1154 ऐसा कर घर आवे राम । और धंदा सब छोर हि काम ॥ ध्रु॥ इतन गोते काहे खाता । जब तूं आपणा भूल न होता ॥1॥ अंतरजामी जानत साचा । मनका एक उपर बाचा ॥2॥ तुकाप्रभु देसबिदेस । भरिया खाली नहिं लेस ॥3॥ 1155 मेरे रामको नाम जो लेवे बारोंबार । त्याके पाऊं मेरे तनकी पैजार ॥ध्रु.॥ हांसत खेलत चालत बाट । खाणा खाते सोते खाट ॥1॥ जातनसुं मुजे कछु नहिं प्यार । असते की नही हेंदु धेड चंभार ॥2॥ ज्याका चित लगा मेरे रामको नाव । कहे तुका मेरा चित लगा त्याके पाव ॥3॥ 1156 आपे तरे त्याकी कोण बराइऩ । औरनकुं भलो नाम घराइऩ ॥ध्रु.॥ काहे भूमि इतना भार राखे । दुभत धेनु नहिं दुध चाखे ॥1॥ बरसतें मेघ फलतेंहें बिरखा । कोन काम अपनी उन्होति रखा ॥2॥ काहे चंदा सुरज खावे फेरा । खिन एक बैठन पावत घेरा ॥3॥ काहे परिस कंचन करे धातु । नहिं मोल तुटत पावत घातु ॥4॥ कहे तुका उपकार हि काज । सब कररहिया रघुराज ॥5॥ 1157 जग चले उस घाट कोन जाय । नहिं समजत फिरफिर गोदे खाय ॥ध्रु.॥ नहिं एकदो सकल संसार । जो बुझे सो आगला स्वार ॥1॥ उपर श्वार बैठे कृष्णांपीठ । नहिं बाचे कोइ जावे लूठ ॥2॥ देख हि डर फेर बैठा तुका । जोवत मारग राम हि एका ॥3॥ 1158 भले रे भाइऩ जिन्हें किया चीज । आछा नहिं मिलत बीज ॥ध्रु.॥ फीरतफीरत पाया सारा । मीटत लोले धन किनारा ॥1॥ तीरथ बरत फिर पाया जोग । नहिं तलमल तुटति भवरोग ॥2॥ कहे तुका मैं ताको दासा । नहिं सिरभार चलावे पासा ॥3॥ 1159 लाल कमलि वोढे पेनाये । मोसु हरिथें कैसें बनाये ॥ध्रु.॥ कहे सखि तुम्हें करति सोर । हिरदा हरिका कठिन कठोर ॥1॥ नहिं क्रिया सरम कछु लाज । और सुनाउं बहुत हे भाज ॥2॥ और नामरूप नहिं गोवलिया । तुकाप्रभु माखन खाया ॥3॥ 1160 राम कहो जीवना फल सो ही । हरिभजनसुं विलंब न पाइऩ ॥ध्रु.॥ कवनका मंदर कवनकी झोपरी । एकारामबिन सब हि फुकरी ॥1॥ कवनकी काया कवनकी माया । एकरामबिन सब हि जाया ॥2॥ कहे तुका सब हि चेलhहार । एकारामविन नहिं वासार ॥3॥ 1161 काहे भुला धनसंपत्तीघोर । रामराम सुन गाउ हो बाप रे ॥ध्रु.॥ राजे लोक सब कहे तूं आपना । जब काल नहीं पाया ठाना ॥1॥ माया मिथ्या मनका सब धंदा । तजो अभिमान भजो गोविंदा ॥2॥ राना रंग डोंगरकी राइऩ । कहे तुका करे इलाहि ॥3॥ 1162 काहे रोवे आगले मरना । गंव्हार तूं भुला आपना ॥ध्रु.॥ केते मालुम नहिं पडे । नन्हे बडे गये सो ॥1॥ बाप भाइऩ लेखा नहिं । पाछें तूं हि चलनार ॥2॥ काले बाल सिपत भये । खबर पकडो तुका कहे ॥3॥ 1163 क्या मेरे राम कवन सुख सारा । कहकर दे पुछूं दास तुह्मारा ॥ध्रु.॥ तनजोबनकी कोन बराइऩ । ब्याधपीडादि स काटहि खाइऩ ॥1॥ कीर्त बधाऊं तों नाम न मेरा । काहे झुटा पछतऊं घेरा ॥2॥ कहे तुका नहिं समज्यात मात । तुह्मारे शरन हे जोडहि हात ॥3॥ 1164 देखत आखों झुटा कोरा । तो काहे छोरा घरंबार ॥ध्रु.॥ मनसुं किया चाहिये पाख । उपर खाक पसारा ॥1॥ कामक्रोधसो संसार । वो सिरभार चलावे ॥2॥ कहे तुका वो संन्यास। छोडे आस तनकी हि ॥3॥ 1165 रामभजन सब सार मिठाइऩ । हरि संताप जनमदुख राइऩ ॥ध्रु.॥ दुधभात घृत सकरपारे । हरते भुक नहि अंततारे ॥1॥ खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ॥2॥ कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ॥3॥ 1166 बारंबार काहे मरत अभागी । बहुरि मरन संक्या तोरेभागी ॥ध्रु.॥ ये हि तन करते क्या ना होय । भजन भगति करे वैकुंठे जाय ॥1॥ रामनाम मोल नहिं वेचे कबरि । वो हि सब माया छुरावत झगरी ॥2॥ कहे तुका मनसुं मिल राखो । रामरस जिव्हा नित्य चाखो ॥3॥ 1167 हम दास तीन्हके सुनाहो लोकां । रावणमार विभीषण दिइऩ लंका ॥ध्रु.॥ गोबरधन नखपर गोकुल राखा । बर्सन लागा जब मेंहुं फत्तरका ॥1॥ वैकुंठनायक काल कौंसासुरका । दैत डुबाय सब मंगाय गोपिका ॥2॥ स्तंभ फोड पेट चिरीया कसेपका । प्रल्हाद के लियें कहे भाइऩ तुकयाका ॥3॥ ॥22॥ ॥ साख्या ॥ 30 ॥ 1168 तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय। भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥1॥ 1169 रामराम कहे रे मन । औरसुं नहिं काज । बहुत उतारे पार । आघे राख तुकाकी लाज ॥1॥ 1170 लोभीकें चित धन बैठे । कामीन चित्त काम । माताके चित पुत बैठें । तुकाके मन राम ॥1॥ 1171 तुका पंखिबहिरन मानुं । बोइऩ जनावर बाग । असंतनकुं संत न मानूं । जे वर्मकुं दाग ॥1॥ 1172 तुका राम बहुत मिठा रे । भर राखूं शरीर । तनकी करूं नावरि । उतारूं पैल तीर ॥1॥ 1173 संतन पन्हयां लें खडा । राहूं ठाकुरद्वार । चलत पाछेंहुं फिरों । रज उडत लेऊं सीर ॥1॥ 1174 तुकाप्रभु बडो न मनूं न मानूं बडो । जिसपास बहु दाम । बलिहारि उस मुखकी । जीसेती निकसे राम ॥1॥ 1175 राम कहे सो मुख भलारे । खाये खीर खांड । हरिबिन मुखमो धूल परी रे । क्या जनि उस रांड ॥1॥ 1176 राम कहे सो मुख भला रे । बिन रामसें बीख । आव न जानूं रमते बेरों । जब काल लगावे सीख ॥1॥ 1177 कहे तुका में सवदा बेचूं । लेवेके तन हार । मिठा साधुसंतजन रे । मुरुखके सिर मार ॥1॥ 1178 तुका दास तिनका रे । रामभजन निरास । क्या बिचारे पंडित करो रे । हात पसारे आस ॥1॥ 1179 तुका प्रीत रामसुं । तैसी मिठी राख । पतंग जाय दीप परे रे । करे तनकी खाक ॥1॥ 1180 कहे तुका जग भुला रे । कहएा न मानत कोय । हात परे जब कालके । मारत फोरत डोय ॥1॥ 1181 तुका सुरा नहि सबदका रे । जब कमाइ न होये । चोट साहे घनकि रे । हिरा नीबरे तोये ॥1॥ 1182 तुका सुरा बहुत कहावे । लडत विरला कोये । एक पावे उंच पदवी । एक खौंसां जोये ॥1॥ 1183 तुका मा†या पेटका । और न जाने कोये । जपता कछु रामनाम । हरिभगतनकी सोये ॥1॥ 1184 काफर सोही आपण बुझे । आला दुनियां भर । कहे तुका तुम्हें सुनो रे भाइऩ । हिरिदा जिन्होका कठोर ॥1॥ 1185 भीस्त न पावे मालथी । पढीया लोक रिझाये । निचा जथें कमतरिण । सो ही सो फल खाये ॥1॥ 1186 फल पाया तो खुस भया । किन्होसुं न करे बाद । बान न देखे मिरगा रे । चित्त मिलाया नाद ॥1॥ 1187 तुका दास रामका । मनमे एक हि भाव । तो न पालटू आव । ये हि तन जाव ॥1॥ 1188 तुका रामसुं चित बांध राखूं । तैसा आपनी हात । धेनु बछरा छोर जावे । प्रेम न छुटे सात ॥1॥ 1189 चितसुं चित जब मिले । तब तनु थंडा होये । तुका मिलनां जिन्होसुं । ऐसा विरला कोये ॥1॥ 1190 चित मिले तो सब मिले । नहिं तो फुकट संग । पानी पाथर येक ही ठोर । कोरनभिगे अंग ॥1॥ 1191 तुका संगत तीन्हसें कहिये । जिनथें सुख दुनाये । दुर्जन तेरा मू काला । थीतो प्रेम घटाये ॥1॥ 1192 तुका मिलना तो भला । मनसुं मन मिल जाय । उपर उपर माटि घसनी । उनकि कोन बराइऩ ॥1॥ 1193 तुका कुटुंब छोरे रे । लरके जोरों सिर गुंदाय । जबथे इच्छा नहिं मुइऩ । तब तूं किया काय ॥1॥ 1194 तुका इच्छा मीटइ तो । काहा करे चट खाक । मथीया गोला डारदिया तो । नहिं मिले फेरन ताक ॥1॥ 1195 ब्रीद मेरे साइंयाके । तुका चलावे पास । सुरा सो हि लरे हमसें । छोरे तनकी आस ॥1॥ 1196 कहे तुका भला भया । हुं हुवा संतनका दास । क्या जानूं केते मरता । जो न मिटती मनकी आस ॥1॥ 1197 तुका और मिठाइऩ क्या करूं रे । पाले विकारपिंड । राम कहावे सो भली रुखी । माखन खांडखीर ॥1॥ ॥30॥ 1198 ह्मणसी नाहीं रे संचित । न करीं न करीं ऐसी मात ॥1॥ लाहो घेइप हरिनामाचा । जन्म जाऊं नेदीं साचा ॥ध्रु.॥ गळां पडेल यमफांसी । मग कैंचा हरि ह्मणसी ॥2॥ पुरलासाटीं देहाडा। ऐसें न ह्मणें न ह्मणें मूढा ॥3॥ नरदेह दुबळा । ऐसें न ह्मणें रे चांडाळा ॥4॥ तुका ह्मणे सांगों किती । सेको तोंडीं पडेल माती ॥5॥ 1199 संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शािब्दकांचे काम नाहीं येथें ॥1॥ बहु धड जरी जाली ह्मैस गाय । तरी होइऩल काय कामधेनु ॥2॥ तुका ह्मणे अंगें व्हावें तें आपण । तरी च महिमान येइऩल कळों ॥3॥ 1200 नाहीं संतपण मिळतें हें हाटीं । हिंडतां कपाटीं रानीं वनीं ॥1॥ नये मोल देतां धनाचिया राशी । नाहीं तें आकाशीं पाताळीं तें ॥1॥ तुका ह्मणे मिळे जिवाचिये साटीं । नाहीं तरी गोष्टी बोलों नये ॥3॥ [[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]] [[वर्ग:गाथा]] elciaevrqq48l55gfphz0a6cqxqamje तुकाराम गाथा/ १२०१ ते १५०० 0 1537 36903 36876 2026-09-19T19:41:48Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36903 wikitext text/x-wiki 1201 नामाची आवडी तो चि जाणा देव । न धरीं संदेह कांहीं मनीं ॥1॥ ऐसें मी हें नाहीं बोलत नेणतां । आनुनि संमता संतांचिया ॥ध्रु.॥ नाम ह्मणे तया आणीक साधन । ऐसें हें वचन बोलों नये ॥2॥ तुका ह्मणे सुख पावे या वचनीं । ज्याचीं शुद्ध दोन्ही मायबापें ॥3॥ 1202 सुखें होतो कोठें घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥1॥ काय करूं बहु गुंतलों आतां । नये सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥ होतें गांठी तें सरलें येतां । आणीक माथां रीण जालें ॥2॥ सोंकरिलियाविण गमाविलें पिक । रांडापोरें भिके लावियेलीं ॥3॥ बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरें कांहीं केल्या ॥4॥ तुका ह्मणे कांहीं न धरावी आस । जावें हें सर्वस्व टाकोनियां ॥5॥ 1203 न मनावें तैसें गुरूचें वचन । जेणें नारायण अंतरे तें। आड आला ह्मुन फोडियेला डोळा । बिळनें आंधळा शुक्र केला ॥1॥ करी देव तरी काय नव्हे एक । कां तुह्मी पृथक सिणा वांयां ॥ध्रु.॥ उलंघुनि भ्रताराची आYाा । अन्न ॠषिपत्न्या घेउनि गेल्या । अवघे चि त्यांचें देवें केलें काज । धर्म आणि लाज राखियेली ॥2॥ पितियासी पुत्रें केला वैराकार । प्रल्हादें असुर मारविला । बहुत विघ्नें केलीं तया आड । परि नाहीं कैवाड सांडियेला ॥3॥ गौळणी करिती देवाशीं व्यभिचार । सांडुनी आचार भ्रष्ट होती । तयां दिलें ते कोणासी नाहीं । अवघा अंतर्बाहीं तो चि जाला ॥4॥ देव जोडे ते करावे अधर्म । अंतरे तें कर्म नाचरावें । तुका ह्मणे हा जाणतो कळवळा । ह्मणोनि अजामेळा उद्धरिलें॥5॥ 1204 अरे गििळले हो संसारें । कांहीं तरि राखा खरें । दिला करुणाकरें । मनुष्यदेह सत्संग ॥1॥ येथें न घलीं न घलीं आड । संचितसा शब्द नाड । उठाउठीं [[गोड]] । बीजें बीज वाढवा ॥ध्रु.॥ केलें ते क्रियमाण । जालें तें संचित ह्मण । प्रारब्ध जाण । उरवरित उरले तें ॥2॥ चित्त खोटें चालीवरि । रोग भोगाचे अंतरीं। रसने अनावरी । तुका ह्मणे ढुंग वाहे ॥3॥ 1205 अग्न तापलिया काया चि होमे । तापत्रयें संतप्त होती । संचित क्रियमाण प्रारब्ध तेथें । न चुके संसारिस्थति । राहाटघटिका जैसी फिरतां चि राहिली । भरली जाती एके रितीं । साधीं हा प्रपंच पंचाय अग्न । तेणें पावसील निजशांती रे ॥1॥ नारायणनाम नारायणनाम । नित्य करीं काम जिव्हामुखें । जन्मजराव्याधि पापपुण्य तेथें । नासती सकळ ही दुःखें ॥ध्रु.॥ शीत उष्ण वन सेवितां कपाट । आसनसमाधी साधीं । तप तीर्थ दान व्रत आचरण। यYा नाना मन बुद्धी । भोगाभोग तेथें न चुकती प्रकार जन्मजरादुःखव्याधि। साहोनि काम क्रोध अहंकार । आश्रमीं अविनाश साधीं ॥2॥ घोकितां अक्षर अभिमानविधि । निषेध लागला पाठी । वाद करितां निंदा घडती दोष होय वज्रलेपो भविष्यति । दूषणाचें मूळ भूषण तुका ह्मणे । सांडीं मिथ्या खंती । रिघोनि संतां शरण सर्वभावें । राहें भलतिया िस्थती ॥3॥ 1206 नव्हे गुरुदास्य संसारियां । वैराग्य तरी भेणें कांपे विषयां । तैसें नाम पंढरीराया । जया सायास न लगती ॥1॥ ह्मणोनि गोड सर्वभावें । आंघोळी न लगे तोंड धुवावें । अर्थचाड जीवें । न लगे भ्यावें संसारा ॥ध्रु.॥ कर्मा तंव न पुरे संसारिक । धर्म तंव फळदायक । नाम विठ्ठलाचें एक । नाशी दुःख भवाचें ॥2॥ न लगे सांडणें मांडणें । आगमनिगमाचें देखणें । अवघें तुका ह्मणे। विठ्ठलनामें आटलें ॥3॥ 1207 नये इच्छूं सेवा स्वइच्छा जगाची । अवYाा देवाची घडे तेणें ॥1॥ देहाचा निग्रही त्याचें तो सांभाळी । मग नये किळ अंगावरी ॥ध्रु.॥ आपलिया इच्छा माता सेवा करी । न बाधी ते थोरी येणें क्षोभें ॥2॥ तुका ह्मणे सांडा देखीचे दिमाख । मोडसीचें दुःख गांड फाडी ॥3॥ 1208 सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागत चि बळ ॥1॥ ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥ करावी च चिंता। नाहीं लागती तत्वता ॥2॥ तुका ह्मणे भावें । शरण ह्मणवितां बरवें ॥3॥ 1209 साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥1॥ पचीं पडे मद्यपान । भांगभुकाऩ हें साधन ॥ध्रु.॥ अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥2॥ चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भंगपाळ ॥3॥ सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥4॥ सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥5॥ 1210 मज पाहातां हें लटिकें सकळ । कोठें मायाजाळ दावीं देवा ॥1॥ कोणाचा कोणासीं न धरे संबंध । आहे शुद्धबुद्ध ठायींचे ठायीं ॥ध्रु.॥ काढा काढा जी मोह बुंथा जाळ । नका लावूं बळें वेड आह्मां ॥2॥ जीव शिव कां ठेवियेलीं नांवें । सत्य तुह्मां ठावें असोनियां ॥3॥ सेवेच्या अभिळासें न धरा चि विचार । आह्मां दारोदार हिंडविलें ॥4॥ आहे तैसें आतां कळलियावरी । परतें सांडा दुरी दुजेपण ॥5॥ तुका ह्मणे काय छायेचा अभिलाष। हंस पावे नाश तारागणीं ॥6॥ 1211 पंचभूतांचा गोंधळ । केला एकेठायीं मेळ । लाविला सबळ । अहंकार त्यापाठीं ॥1॥ तेथें काय मी तें माझें । कोण वागवी हें ओझें । देहा केवीं रिझे । हें काळाचें भातुकें ॥ध्रु.॥ जीव न देखे मरण । धरी नवी सांडी जीर्ण । संचित प्रमाण । भोगा शुभा अशुभा ॥2॥ इच्छा वाढवी ते वेल । खुंटावा तो खरा बोल । तुका ह्मणे मोल । झाकलें तें पावेल ॥3॥ 1212 पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी ॥1॥ देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥ अवघियांचा विसर जाला। हा राहिला उदेग ॥2॥ तुका ह्मणे चिंता वाटे । कोण भेटे सांगेसें॥3॥ 1213 जाळा तुह्मी माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥1॥ खादलें पचे तरि च तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥ तरि भलें भोगे जोडिलें तें धन । पडिलिया खानें जीवनासी ॥2॥ तुका ह्मणे मज तारीं गा विठ्ठला । नेणतां चि भला दास तुझा ॥3॥ 1214 याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥1॥ केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥ जें कांहीं करितों तें माझे स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥2॥ जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥3॥ तुका ह्मणे यासी नांवाचा अभिमान। ह्मणोनि शरण तारी बळें ॥4॥ 1215 बहु उतावीळ भHीचिया काजा । होसी केशीराजा मायबापा ॥1॥ तुझ्या पायीं मज जालासे विश्वास । ह्मणोनियां आस मोकलिली ॥ध्रु.॥ ॠषि मुनि सिद्ध साधक अपार । कळला विचार त्यांसी तुझा ॥2॥ नाहीं नास तें सुख दिलें तयांस । जाले जे उदास सर्वभावें ॥3॥ तुका ह्मणे सुख न माये मानसीं । धरिले जीवेंसी पाय तुझे ॥4॥ 1216 माया मोहोजाळीं होतों सांपडलों । परि या विठ्ठला कृपा आली ॥1॥ काढूनि बाहेरि ठेविलों निराळा । कवतुक डोळां दाखविलें ॥ध्रु.॥ नाचे उडे माया करी कवतुक । नासिवंत सुखें साच केलीं ॥2॥ रडे काुंफ्दे दुःखें कुटितील माथा । एकासी रडतां तें ही मरे ॥3॥ तुका ह्मणे मज वाटतें नवल । मी माझे बोल ऐकोनियां ॥4॥ 1217 देहभाव आह्मी राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥1॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तो चि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥ ह्मणउनी नाहीं सुख दुःख मनीं । ऐकिलिया कानीं वचनाचें ॥2॥ जालों मी निःसंग निवांत एकला । भार त्या विठ्ठला घालूनियां ॥3॥ तुका ह्मणे जालों जयाचे अंकित । तो चि माझें हित सर्व जाणे ॥4॥ 1218 आलें फळ तेव्हां राहिलें पिकोन । जरी तें जतन होय देंठीं ॥1॥ नामें चि सििद्ध नामें चि सििद्ध । व्यभिचारबुिद्ध न पवतां ॥ध्रु.॥ चालिला पंथ तो पावइऩल ठाया । जरि आड तया नये कांहीं ॥2॥ तुका ह्मणे मध्यें पडती आघात । तेणें होय घात हाणी लाभ ॥3॥ 1219 निरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥1॥ ह्मणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥ देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥2॥ तुका ह्मणे देव अंतरे ज्यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥3॥ 1220 तुजशीं संबंध चि खोटा । परता परता रे थोंटा ॥1॥ देवा तुझें काय घ्यावें । आप आपणां ठकावें ॥ध्रु.॥ जेथें मुदल न ये हातां । व्याज मरावें लेखितां ॥2॥ तुका ह्मणे ऐसा । त्रिभुवनीं तुझा ठसा ॥3॥ 1221 या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों रिणकरी ॥1॥ सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥ सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥2॥ एकें एक बुझाविसी । तुका ह्मणे ठक होसी ॥3॥ 1222 आह्मी जाणों तुझा भाव । दृढ धरियेले पाव ॥1॥ फांकुं नेदूं चुकावितां । नेघों थोडें बहु देतां ॥ध्रु.॥ बहुता दिसाचें लिगाड । आलें होत होत जड ॥2॥ तुका ह्मणे आतां । नेघें सर्वस्व ही देतां ॥3॥ 1223 रिण वैर हत्या । हें तों न सुटे नेंदितां ॥1॥ हें कां नेणां पांडुरंगा । तुह्मी सांगतसां जगा ॥ध्रु.॥ माझा संबंध तो किती। चुकवा लोकाची फजिती ॥2॥ तुका ह्मणे या चि साठीं । मज न घेतां नये तुटी ॥3॥ 1224 नाहीं मागितला । तुह्मां मान म्यां विठ्ठला ॥1॥ जे हे करविली फजिती । माझी एवढी जना हातीं ॥ध्रु.॥ नाहीं केला पोट । पुढें घालूनि बोभाट ॥2॥ तुका ह्मणे धरूनि हात । नाहीं नेले दिवानांत ॥3॥ 1225 तूं पांढरा स्पटिक मणी । करिसी आणिकां त्याहुनि ॥1॥ ह्मणोनि तुझ्या दारा । न येत ठकती दातारा ॥ध्रु.॥ तुझी ठावी नांदनूक । अवघा बुडविला लोक ॥2॥ तुका ह्मणे ज्याचें घेसी । त्यास हें चि दाखविसी ॥3॥ 1226 बोलतों निकुरें । नव्हेत सलगीचीं उत्तरें ॥1॥ माझे संतापलें मन । परपीडा ऐकोन ॥ध्रु.॥ अंगावरि आलें । तोंवरि जाइऩल सोसिलें ॥2॥ तुज भHांची आण देवा । जरि तुका येथें ठेवा ॥3॥ 1227 बुद्धीचा जनिता लIमीचा पति । आठवितां चित्तीं काय नव्हे ॥1॥ आणिकां उपायां कोण वांटी मन । सुखाचें निधान पांडुरंग ॥ध्रु.॥ गीत गावों नाचों छंदें वावों टाळी । वैष्णवांचे मेळीं सुखरूप ॥2॥ अनंत ब्रह्मांडें एके रोमावळी । आह्मी केला भोळीं भावें उभा ॥3॥ लडिका हा केला संवसारसिंधु ॥ मोक्ष खरा बंधु नाहीं पुढें ॥4॥ तुका ह्मणे ज्याच्या नामाचे अंकित । राहिलों नििंश्चत त्याच्या बळें ॥5॥ 1228 न लगे मायेसी बाळें निरवावें । आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ॥1॥ मज कां लागला करणें विचार । ज्याचा जार भार त्याचे मायां ॥ध्रु.॥ गोड धड त्यासी ठेवी न मगतां । समाधान खातां नेदी मना ॥2॥ खेळतां गुंतलें उमगूनी आणी । बैसोनियां स्तनीं लावी बळें ॥3॥ त्याच्या दुःखेंपणें आपण खापरीं । लाही तळीं वरी होय जैसी ॥4॥ तुका ह्मणे देह विसरे आपुला । आघात तो त्याला लागों नेदी ॥5॥ 1229 ब्राह्मण तो नव्हे ऐसी ज्यासी बुिद्ध । पाहा श्रुतीमधीं विचारूनि ॥1॥ जयासी नावडे हरिनामकीर्तन । आणीक नृत्य न वैष्णवांचें ॥ध्रु.॥ सत्य त्याचे वेळे घडला व्यभिचार । मातेसी वेव्हार अंत्यजाचा ॥2॥ तुका ह्मणे येथें मानी आनसारिखें । तात्काळ तो मुखें कुष्ट होय ॥3॥ 1230 ब्राह्मण तो याती अंतेज असतां । मानावा तत्वता निश्चयेसी ॥1॥ रामकृष्णें नाम उच्चारी सरळें । आठवी सांवळें रूप मनीं ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया अलंकार अंगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥2॥ तुका ह्मणे गेल्या शडऊर्मी अंगें । सांडुनियां मग ब्रह्मं चि तो ॥3॥ 1231 एक करिती गुरु गुरु । भोंवता भारु शिष्यांचा ॥1॥ पुंस नाहीं पाय चारी । मनुष्य परी कुतरीं तीं ॥ध्रु.॥ परस्त्री मद्यपान। पेंडखान माजविलें ॥2॥ तुका ह्मणे निर्भर चित्तीं । अधोगती जावया ॥3॥ 1232 एका पुरुषा दोघी नारी । पाप वसे त्याचे घरीं ॥1॥ पाप न लगे धुंडावें । लागेल तेणें तेथें जावें ॥ध्रु.॥ कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥2॥ असत्य जे वाणी । तेथें पापाची च खाणी ॥3॥ सत्य बोले मुखें । तेथें उचंबळती सुखें ॥4॥ तुका ह्मणे दोन्ही । जवळी च लाभहानी ॥5॥ 1233 जळातें संचित । ऐसी आहे धर्म नीत ॥1॥ माझ्या विठोबाचे पाय । वेळोवेळां मनीं ध्याय ॥ध्रु.॥ नेदी कर्म घडों । कोठें आडराणें पडों ॥2॥ तुका ह्मणे मळ । राहों नेदी ताप जाळ ॥3॥ 1234 संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥1॥ वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरि दंड तेणें ॥ध्रु.॥ समय नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥2॥ तुका ह्मणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥3॥ 1235 घेसी तरी घेइप संताची भेटी । आणीक ते गोष्टी नको मना ॥1॥ सर्वभावें त्यांचें देव भांडवल । आणीक ते बोल न बोलती ॥ध्रु.॥ करिसील तो करीं संतांचा सांगत । आणीक ते मात नको मना ॥2॥ बैससी तरी बैस संतां च मधीं । आणीक ते बुिद्ध नको मना ॥3॥ जासी तरि जाइप संतांचिया गांवां । होइऩल विसावा तेथें मना ॥4॥ तुका ह्मणे संत सुखाचे सागर । मना निरंतर धणी घेइप ॥5॥ 1236 संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥1॥ तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥ संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥2॥ संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥3॥ संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साटीं घेती देती ॥4॥ तुका ह्मणे तेथें आणिक नाहीं परी । ह्मणोनि भिकारी जालों त्यांचा ॥5॥ 1237 संतांचें सुख जालें या देवा । ह्मणऊनि सेवा करी त्यांची ॥1॥ तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥ निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥2॥ तीथॉ त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥3॥ अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥4॥ तुका ह्मणे ते बिळया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥5॥ 1238 जो मानी तो देइऩल काइऩ । न मनी तो नेइऩल काइऩ ॥1॥ आह्मां विठ्ठल सर्वभूतीं । राहो चित्तीं भलतैसा ॥ध्रु.॥ आध्येन तें जना काइऩ । जल्पें वांयांविण ठायीं ॥2॥ वंदी निंदी तुज तो गा। तुका ह्मणे पांडुरंगा ॥3॥ 1239 भावबळें कैसा जालासी लाहान । मागें संतीं ध्यान वणिऩयेलें ॥1॥ तें मज उचित करूनियां देवा । दाखवीं केशवा मायबापा ॥ध्रु.॥ पाहोनियां डोळां बोलेन मी गोष्टी । आळंगुनि मिठी देइन पांयीं ॥2॥ चरणीं दृिष्ट उभा राहेन समोर । जोडोनियां कर पुढें दोन्ही ॥3॥ तुका ह्मणे उत्कंठित वासना । पुरवीं नारायणा आर्त माझें ॥4॥ 1240 कृपाळु ह्मणोनि बोलती पुराणें । निर्धार वचनें यांचीं मज ॥1॥ आणीक उपाय नेणें मी कांहीं । तुझें वर्म ठायीं पडे तैसें ॥ध्रु.॥ नये धड कांहीं बोलतां वचन । रिघालों शरण सर्वभावें ॥2॥ कृपा करिसी तरि थोडें तुज काम । माझा तरि श्रम बहु हरे ॥3॥ तुका ह्मणे मज दाखवीं श्रीमुख । हरेल या भूक डोिळयांची ॥4॥ 1241 सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनेंसहित देवा ॥1॥ आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥ माझिये वारचें कांहीं जडभारी । तुजविण वारी कोण एक ॥3॥ तुझे आह्मी दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥3॥ तुका ह्मणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देइप ॥4॥ 1242. कइप मात माझे ऐकती कान । बोलतां वचन संतां मुखीं ॥1॥ केला पांडूरंगें तुझा अंगीकार । मग होइल धीर माझ्या जीवा ॥ध्रु.॥ ह्मणऊनि मुख अवलोकितों पाय । हे चि मज आहे थोरी आशा ॥2॥ माझिया मनाचा हा चि विश्वास । न करीं सायास साधनांचे ॥3॥ तुका ह्मणे मज होइऩल भरवसा । तरलों मी ऐसा साच भाव ॥4॥ 1243 दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साटीं । भिHकाजें विठ्ठला ॥1॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥ होतासी क्षीरसागरीं । मही दाटली असुरीं । ह्मणोनियां घरीं। गौिळयांचे अवतार ॥2॥ केला पुंडलिकें गोवा । तुज पंढरीसि देवा। तुका ह्मणे भावा । साटीं हातीं सांपडसी ॥3॥ 1244 गोड जालें पोट धालें । अवचित वाचे आलें । ह्मणतां पाप गेलें । विठ्ठलसें वाचेसी ॥1॥ सत्य माना रे सकळ । उद्धरिला अजामेळ । पातकी चांडाळ । नामासाटीं आपुलिया ॥ध्रु.॥ चित्त पावलें आनंदा । सुखसमाधीतें सदा । ह्मणतां गोविंदा । वेळोवेळां वाचेसी ॥2॥ हें जाणती अनुभवी । जया चाड तो चोजवी । तुका ह्मणे दावी । रूप तें चि अरूपा ॥3॥ 1245 आंत हरि बाहेर हरि । हरिनें घरीं कोंडिलें ॥1॥ हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें ॥ध्रु.॥ हरिने जीवें केली साटी । पाडिली तुटी सकळांसी ॥2॥ तुका ह्मणे वेगळा नव्हे । हरि भोवे भोंवताला ॥3॥ 1246 हरिनें माझें हरिलें चित्त । भार वित्त विसरलें ॥1॥ आतां कैसी जाऊं घरा । नव्हे बरा लौकिक ॥ध्रु.॥ पारखियांसी सांगतां गोटी । घरची कुटी खातील ॥2॥ तुका ह्मणे निवांत राहीं। पाहिलें पाहीं धणीवरि ॥3॥ ॥ भुपाऑया ॥ अभंग ॥ 8 ॥ 1247 बोलोनि दाऊं कां तुह्मी नेणा जी देवा । ठेवाल तें ठेवा ठायीं तैसा राहेन ॥1॥ पांगुळलें मन कांहीं नाठवे उपाय । ह्मणऊनि पाय जीवीं धरूनि राहिलों ॥ध्रु.॥ त्यागें भोगें दुःख काय सांडावें मांडावें । ऐसी धरियेली जीवें माझ्या थोरी आशंका ॥2॥ तुका ह्मणे माते बाळा चुकलिया वनीं । न पवतां जननी दुःख पावे विठ्ठले ॥3॥ 1248 ऐसी वाट पाहे कांहीं निरोप कां मूळ । कंा हे कळवळ तुज उमटे चि ना ॥1॥ आवो पांडुरंगे पंढरीचे निवासे । लावूनियां आस चाळवूनी ठेविलें ॥ध्रु.॥ काय जन्मा येवूनियां केली म्यां जोडी। ऐसें घडीघडी चित्तां येतें आठवूं ॥2॥ तुका ह्मणे खरा न पवे चि विभाग । धिकारितें जग हें चि लाहों हिशोबें ॥3॥ 1249 कां गा किविलवाणा केलों दीनाचा दीन । काय तुझी हीन शिH जालीसी दिसे ॥1॥ लाज येते मना तुझा ह्मणवितां दास । गोडी नाहीं रस बोलिली यासारिखी ॥ध्रु.॥ लाजविलीं मागें संतांची हीं उत्तरें । कळों येतें खरें दुजें एकावरूनि ॥2॥ तुका ह्मणे माझी कोणें वदविली वाणी । प्रसादावांचूनि तुमचिया विठ्ठला ॥3॥ 1250 जळो माझें कर्म वायां केली कटकट । जालें तैसें तंट नाहीं आलें अनुभवा ॥1॥ आता पुढें धीर काय देऊं या मना। ऐसें नारायणा प्रेरिलें तें पाहिजे ॥ध्रु.॥ गुणवंत केलों दोष जाणायासाठीं। माझें माझें पोटीं बळकट दूषण ॥2॥ तुका ह्मणे अहो केशीराजा दयाळा । बरवा हा लळा पािळयेला शेवटीं ॥3॥ 1251 कामें नेलें चित्त नेदी अवलोकुं मुख । बहु वाटे दुःख फुटों पाहे हृदय ॥1॥ कां जी सासुरवासी मज केलें भगवंता । आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाहीं ॥ध्रु.॥ प्रभातेसि वाटे तुमच्या यावें दर्शना । येथें न चले चोरी उरली राहे वासना ॥2॥ येथें अवघे वांयां गेले दिसती सायास । तुका ह्मणे नास दिसे जाल्या वेचाचा ॥3॥ 1252 जळोत तीं येथें उपजविती अंतराय । सायासाची जोडी माझी तुमचे पाय ॥1॥ आतां मज साहे येथें करावें देवा । तुझी घेइप सेवा सकळ गोवा उगवूनि ॥ध्रु.॥ भोगें रोगा जोडोनियां दिलें आणीकां । अरुचि ते हो कां आतां सकळांपासूनि ॥2॥ तुका ह्मणे असो तुझें तुझे मस्तकीं । नाहीं ये लौकिकीं आतां मज वर्तनें ॥3॥ 1253 न संगतां तुह्मां कळों येतें अंतर । विश्वीं विश्वंभर परिहार चि न लगे ॥1॥ परि हे अनावर आवरितां आवडी । अवसान ते घडी पुरों देत नाहीं ॥ध्रु.॥ काय उणें मज येथें ठेविलिये ठायीं । पोटा आलों तइपपासूनिया समर्थ ॥2॥ तुका ह्मणे अवघी आवरिली वासना । आतां नारायणा दुसरियापासूनि ॥3॥ 1254 तुजसवें आह्मीं अनुसरलों अबळा । नको अंगीं कळा राहों हरी हीन देऊं ॥1॥ सासुरवासा भीतों जीव ओढे तुजपाशीं । आतां दोहऴिवशीं लज्जा राखें आमुची ॥ध्रु.॥ न कळतां संग जाला सहज खेळतां । प्रवर्तली चिंता मागिलांचियावरि ॥2॥ तुका ह्मणे असतां जैसें तैसें बरवें । वचन या भावें वेचुनियां विनटलों ।3॥ ॥8॥ 1255 रवि दीप हीरा दाविती देखणे । अदृश्य दर्षने संतांचे नी ॥1॥ त्यांचा महिमा काय वणूप मी पामर । न कळे तो साचार ब्रह्मादिकां ॥ध्रु.॥ तापली चंदन निववितो कुडी । त्रिगुण तो काढी संतसंग ॥2॥ मायबापें पिंड पाळीला माया । जन्ममरण जाया संतसंग ॥3॥ संतांचें वचन वारी जन्मदुःख । मिष्टान्न तें भूकनिवारण ॥4॥ तुका ह्मणे जवळी न पाचारितां जावें । संतचरणीं भावें रिघावया ॥5॥ 1256 हरि हरि तुह्मीं ह्मणा रे सकळ । तेणें मायाजाळ तुटइऩल ॥1॥ आणिका नका कांहीं गाबाळाचे भरी । पडों येथें थोरी नागवण ॥ध्रु.॥ भावें तुळसीदळ पाणी जोडा हात । ह्मणावा पतित वेळोवेळां ॥2॥ तुका ह्मणे ही तंव कृपेचा सागर । नामासाटीं पार पाववील ॥3॥ 1257 ऐसे कुळीं पुत्र होती । बुडविती पूर्वजा ॥1॥ चाहाडी चोरी भांडवला । वांटा आला भागासी ॥ध्रु.॥ त्याचियानें दुःखी मही । भार तेही न साहे ॥2॥ तुका ह्मणे ग्रामपशु । केला नाशु अयुषा ॥3॥ 1258 गांठोळीस धन भाकावी करुणा । दावूनि सज्जना कींव पीडी ॥1॥ नाठेळाची भिH कुचराचें बळ । कोरडें वोंगळ मार खाय ॥ध्रु.॥ सांडोव्यासी घाली देवाची करंडी । विल्हाळ त्या धोंडी पूजा दावी ॥2॥ तुका ह्मणे ऐसे माकडाचे छंद । अवघे धंदधंद सिंदळीचे ॥3॥ 1259 कैसें असोनि ठाउकें नेणां । दुःख पावाल पुढिले पेणा ॥1॥ आतां जागें रे भाइऩ जागें रे । चोर निजल्या नाडूनि भागे रे ॥ध्रु.॥ आतां नका रे भाइऩ नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोकां रे ॥2॥ तुका ह्मणे एकांच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥3॥ 1260 मुदल जतन जालें । मग लाभाचें काय आलें ॥1॥ घरीं देउनि अंतर गांठी । राख्या पारिख्यां न सुटे मिठी ॥ध्रु.॥ घाला पडे थोडें च वाटे । काम मैंदाचें च पेटे ॥2॥ तुका ह्मणे वरदळ खोटें । फांसे अंतरिंच्या कपटें ॥3॥ 1261 मज अंगाच्या अनुभवें । काइऩ वाइऩट बरें ठावें ॥1॥ जालों दोहींचा देखणा । नये मागें पुढें ही मना ॥ध्रु.॥ वोस वसती ठावी । परि हे चाली दुःख पावी ॥2॥ तुका ह्मणे घेऊं देवा । सवें करूनि बोळावा ॥3॥ 1262 पाववावें ठाया । ऐसें सवें बोलों तया ॥1॥ भावा ऐसी क्रिया राखे । खोटएा खोटेपणें वाखे ॥ध्रु.॥ न ठेवूं अंतर । कांहीं भेदाचा पदर ॥2॥ तुका ह्मणे जीवें भावें । सत्या मानविजे देवें ॥3॥ 1263 मोल देऊनियां सांटवावे दोष । नटाचे ते वेश पाहोनियां ॥1॥ हरिदासां मुखें हरिकथाकीर्तन । तेथें पुण्यें पुण्य विशेषता ॥ध्रु.॥ हरितील वस्त्रें गोपिकांच्या वेशें । पाप त्यासरिसें मात्रागमन ॥2॥ तुका ह्मणे पाहा ऐसें जालें जन । सेवाभिHहीन रसीं गोडी ॥3॥ 1264 बहुक्षीदक्षीण । आलों सोसुनियां वन ॥1॥ विठोबा विसांवया विसांवया । पडों देइप पायां ॥ध्रु.॥ बहुतां काकुलती । आलों सोसिली फजिती ॥2॥ केली तुजसाटीं । तुका ह्मणे येवढी आटी ॥3॥ 1265 कां गा धर्म केला । असोन सत्तेचा आपुला ॥1॥ उभाउभीं पाय जोडीं । आतां फांकों नेदीं घडी ॥ध्रु.॥ नको सोडूं ठाव । आतां घेऊं नेदीं वाव ॥2॥ तुका ह्मणे इच्छा । तैसा करीन सरिसा ॥3॥ 1266 तुमची तों भेटी नव्हे ऐसी जाली । कोरडी च बोली ब्रह्मYाान ॥1॥ आतां न बोलावें ऐसें वाटे देवा । संग न करावा कोणांसवें ॥ध्रु.॥ तुह्मां निमित्यासी सांपडले अंग । नेदावा हा संग विचारिलें ॥2॥ तुका ह्मणे माझी राहिली वासना । आवडी दर्शनाची च होती ॥3॥ 1267 आहे तें चि आह्मी मागों तुजपाशीं । नव्हों तुज ऐसीं क्रियानष्टें ॥1॥ न बोलावीं तों च वर्में बरें दिसे । प्रकट ते कैसे गुण करूं ॥ध्रु.॥ एका ऐसें एका द्यावयाचा मोळा । कां तुह्मां गोपाळा नाहीं ऐसा ॥2॥ तुका ह्मणे लोकां नाहीं कळों आलें । करावें आपुलें जतन तों ॥3॥ 1268 आह्मीं याची केली सांडी । कोठें तोंडीं लागावें ॥1॥ आहे तैसा असो आतां चिंतें चिंता वाढते ॥ध्रु.॥ बोलिल्याचा मानी सीण । भिन्न भिन्न राहावें ॥2॥ तुका ह्मणे आह्मांपाशीं । धीराऐसी जतन ॥3॥ 1269 आह्मांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥1॥ करूनि ठेलों जीवेंसाटीं । होय भेटी तोंवरि ॥ध्रु.॥ लागलों तों न फिरें पाठी । पडिल्या गांठी वांचूनि ॥2॥ तुका ह्मणे अवकाशें । तुमच्या ऐसें होवया ॥3॥ 1270 बोलिलें चि बोलें पडपडताळूनि । उपजत मनीं नाहीं शंका ॥1॥ बहुतांची माय बहुत कृपाळ । साहोनि कोल्हाळ बुझाविसी ॥ध्रु.॥ बहुतांच्या भावें वांटिसी भातुकें । बहु कवतुकें खेळविसी ॥2॥ तुका ह्मणे ऐसें जाणतसों वर्म । करणें तो श्रम न वजे वांयां॥3॥ ॥12॥ 1271 कोठें भोग उरला आतां । आठवितां तुज मज ॥1॥ आड कांहीं नये दुजें । फळ बीजें आणिलें ॥ध्रु.॥ उद्वेग ते वांयांविण। कैंचा सीण चिंतनें ॥2॥ तुका ह्मणे गेला भ्रम । तुमच्या धर्में पायांच्या ॥3॥ 1272 संसार तो कोण देखे । आह्मां सखे हरिजन ॥1॥ काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥ स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥2॥ तुका ह्मणे ब्रह्मरसें । होय सरिसें भोजन ॥3॥ 1273 पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उसीर कां आझूनि लावियेला ॥1॥ येइप गा विठ्ठला येइप गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥ध्रु.॥ काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥2॥ तुका ह्मणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥3॥ 1274 आपुले गांवींचें न देखेसें जालें । परदेसी एकलें किती कंठूं ॥1॥ ह्मणऊनि पाहें मूळ येतां वाटे । जीवलग भेटे कोणी तरी ॥ध्रु.॥ पाहातां अवघ्या दिसतील दिशा । सकळ ही वोसा दृष्टीपुढें ॥2॥ तुका ह्मणे कोणी न संगे वारता । तुझी वाटे चिंता पांडुरंगा ॥3॥ 1275 जन तरी देखें गुंतलें प्रपंचें । स्मरण तें त्याचें त्यासी नाहीं ॥1॥ ह्मणऊनि मागें परतलें मन । घालणीचें रान देखोनियां ॥ध्रु.॥ इंिद्रयांचा गाजे गोंधळ ये ठायीं । फोडीतसे डोइऩ अहंकार ॥2॥ तुका ह्मणे देवा वासनेच्या आटें । केलीं तळपटें बहुतांचीं ॥3॥ 1276 धांवे त्यासी फावे । दुजे उगवूनि गोवे ॥1॥ घ्यावें भरूनियां घर । मग नाहीं येरझार ॥ध्रु.॥ धणी उभें केलें । पुंडलिकें या उगलें ॥2॥ तुका ह्मणे ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥3॥ 1277 लाहानपण दे गा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥1॥ ऐरावत रत्न थोर । तया अंकुशाचा मार ॥ध्रु.॥ ज्याचे अंगीं मोठेपण । तया यातना कठीण ॥2॥ तुका ह्मणे जाण । व्हावें लाहनाहुनि लाहन ॥3॥ 1278 निंचपण बरवें देवा । न चले कोणाचा ही दावा ॥1॥ महा पुरें झाडें जाती । तेथें लव्हाळे राहाती ॥ध्रु.॥ येतां सिंधूच्या लहरी । नम्र होतां जाती वरि ॥2॥ तुका ह्मणे कळ । पाय धरिल्या न चले बळ ॥3॥ 1279 उष्टएा पत्रावळी करूनियां गोळा । दाखविती कळा कवित्वाची ॥1॥ ऐसे जे पातकी ते नरकीं पचती । जोंवरी भ्रमती चंद्रसूर्य ॥2॥ तुका ह्मणे एक नारायण घ्याइप । वरकडा वाहीं शोक असे ॥3॥ 1280 आवडीच्या मतें करिती भजन । भोग नारायणें ह्मणती केला ॥1॥ अवघा देव ह्मणे वेगळें तें काय । अर्थासाठीं डोय फोडूं पाहे ॥ध्रु.॥ लाजे कमंडल धरितां भोपळा । आणीक थीगळा प्रावरणा ॥2॥ शाला गडवे धातुद्रव्यइच्छा चित्तीं । नैश्वर्य बोलती अवघें मुखें ॥3॥ तुका ह्मणें यांस देवा नाहीं भेटी । ऐसे कल्पकोटि जन्म घेतां ॥4॥ 1281 ह्मणतां हरिदास कां रे नाहीं लाज । दीनास महाराज ह्मणसी हीना ॥1॥ काय ऐसें पोट न भरे तें गेलें । हालविसी कुले सभेमाजी ॥2॥ तुका ह्मणे पोटें केली विटंबना । दीन जाला जना कींव भाकी ॥3॥ 1282 रििद्धसिद्धी दासी कामधेनु घरीं । परि नाहीं भाकरी भक्षावया ॥1॥ लोडें वालिस्तें पलंग सुपति । परि नाहीं लंगोटी नेसावया ॥ध्रु.॥ पुसाल तरि आह्मां वैकुंठींचा वास । परि नाहीं राहएास ठाव कोठें ॥2॥ तुका ह्मणे आह्मी राजे त्रैलोक्याचे । परि नाहीं कोणाचें उणे पुरें ॥3॥ 1283 घरोघरीं अवघें जालें ब्रह्मYाान । परि मेळवण बहु माजी ॥1॥ निरें कोणापाशीं होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ॥ध्रु.॥ आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दूरोनि दिसतसे ॥2॥ काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आंत काळकूट ॥3॥ तुका ह्मणे तेथें कांहीं हातां नये । आयुष्य मोलें जाये वांयांविण ॥4॥ 1284 अवघ्या भूतांचें केलें संतर्पण । अवघी च दान दिली भूमि ॥1॥ अवघा चि काळ दिनरात्रशुद्धी । साधियेली विधि पर्वकाळ ॥ध्रु.॥ अवघीं च तीथॉ व्रतें केले याग । अवघें चि सांग जालें कर्म ॥2॥ अवघें चि फळ आलें आह्मां हातां । अवघें चि अनंता समपिऩलें ॥3॥ तुका ह्मणे आतां बोलों अबोलणें । कायावाचामनें उरलों नाहीं ॥4॥ 1285 महुरा ऐसीं फळें नाहीं । आलीं कांहीं गळती ॥1॥ पक्वदशे येती थोडीं । नास आढी वेचे तो ॥ध्रु.॥ विरुळा पावे विरुळा पावे । अवघड गोवे सेवटाचे ॥2॥ उंच निंच परिवार देवी। धन्या ठावी चाकरी ॥3॥ झळके तेथें पावे आणी । ऐसे क्षणी बहु थोडे ॥4॥ पावेल तो पैल थडी । ह्मणों गडी आपुला ॥5॥ तुका ह्मणे उभा†यानें । कोण खरें मानितसे ॥6॥ 1286 अवघ्या उपचारा । एक मनें चि दातारा ॥1॥ घ्यावी घ्यावी हे चि सेवा । माझी दुर्बळाची देवा ॥ध्रु.॥ अवघियाचा ठाव। पायांवरि जीवभाव ॥2॥ चित्ताचें आसन । तुका करितो कीर्तन ॥3॥ 1287 आली सलगी पायांपाशीं । होइल तैसी करीन ॥1॥ आणीक आह्मीं कोठें जावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥ अवघ्या निरोपणा भाव । हा चि ठाव उरलासे ॥2॥ तुका ह्मणे पाळीं लळे। कृपाळुवे विठ्ठले ॥3॥ 1288 देह आणि देहसंबंधें निंदावीं । इतरें वंदावीं श्वानशूकरें ॥1॥ येणें नांवें जाला मी माझ्याचा झाडा । मोहा नांवें खोडा गर्भवास ॥ध्रु.॥ गृह आणि वित्त स्वदेशा विटावें । इतरा भेटावें श्वापदझाडां ॥2॥ तुका ह्मणे मी हें माझें न यो वाचे । येणें नांवें साचे साधुजन ॥3॥ 1289 देवाचिये माथां घालुनियां भार । सांडीं किळवर ओंवाळूनि ॥1 ॥ नाथिला हा छंद अभिमान अंगीं । निमित्याचे वेगीं सारीं ओझें ॥ध्रु.॥ करुणावचनीं लाहो एकसरें । नेदावें दुसरें आड येऊं ॥2॥ तुका ह्मणे सांडीं लटिक्याचा संग । आनंद तो मग प्रगटेल ॥3॥ 1290 देह नव्हे मी हें सरे । उरला उरे विठ्ठल ॥1॥ ह्मणऊनि लाहो करा । काळ सारा चिंतनें ॥ध्रु.॥ पाळणाची नाहीं चिंता । ठाव रिता देवाचा ॥2॥ तुका ह्मणे जीवासाटीं । देव पोटीं पडेल ॥3॥ 1291 पृथक मी सांगों किती । धर्म नीती सकळां ॥1॥ अवघियांचा एक ठाव । शुद्ध भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ क्षराअक्षराचा भाग । करा लाग पंढरीये ॥2॥ तुका ह्मणे आगमींचें । मथिलें साचें नवनीत ॥3॥ 1292 पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥1॥ आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । ह्मणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥ नागवला अल्प लोभाचिये साटीं । घेऊनि कांचवटि परिस दिला ॥2॥ तुका ह्मणे हात झाडिले परत्रीं । श्रम तो चि श्रोत्रीं वेठी केली ॥3॥ 1293 अंतरींचें ध्यान । मुख्य या नांवें पूजन ॥1॥ उपाधि तें अवघें पाप । गोड निरसतां संकल्प ॥ध्रु.॥ आYाा पाळावी हा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥2॥ तुका ह्मणे वृित्त । अविट हे सहज िस्थति ॥3॥ 1294 मूळ करणें संतां । नाहीं मिळत उचिता ॥1॥ घडे कासयानें सेवा । सांग ब्रह्मांडाच्या जीवा ॥ध्रु.॥ सागर सागरीं । सामावेसी कैंची थोरी ॥2॥ तुका ह्मणे भावें । शरण ह्मणवितां बरवें ॥3॥ 1295 बरवी नामावळी । तुझी महादोषां होळी ॥1॥ जालें आह्मांसी जीवन । धणीवरि हें सेवन ॥ध्रु.॥ सोपें आणि गोड । किती अमृता ही वाड ॥2॥ तुका ह्मणे अच्युता । आमचा कल्पतरु दाता ॥3॥ 1296 त्रुशाकाळें उदकें भेटी । पडे मिठी आवडीची ॥1॥ ऐसियाचा हो कां संग । जिवलग संतांचा ॥ध्रु.॥ मिष्टान्नाचा योग भुके । ह्मणतां चुके पुरेसें ॥2॥ तुका ह्मणे माते बाळा । कळवळा भेटीचा ॥3॥ 1297 कुचराचे श्रवण । गुणदोषांवरि मन ॥1॥ असोनियां नसे कथे । मूर्ख अभाग्य तें तेथें ॥ध्रु.॥ निरर्थक कारणीं । कान डोळे वेची वाणी ॥2॥ पापाचे सांगाती । तोंडीं ओढाळांचे माती ॥3॥ हिताचिया नांवें । वोस पडिले देहभावें ॥4॥ फजीत करूनि सांडीं । तुका करी बोडाबोडी ॥5॥ 1298 जग तरि आह्मां देव । परि हे निंदितों स्वभाव ॥1॥ येतो हिताचा कळवळा । पडती हातीं ह्मुन काळा ॥ध्रु.॥ नाहीं कोणी सखा । आह्मां निपराध पारिखा ॥2॥ उपक्रमें वदे । तुका वर्मासी तें भेदे ॥3॥ 1299 सोपें वर्म आह्मां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥1॥ समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसें हें कीर्तन ब्रह्मरस ॥ध्रु.॥ पुढती घडे चढतें सेवन आगळें । भिHभाग्यबळें निर्भरता ॥2॥ उपजों चि नये संदेह चित्तासी । मुिH चारी दासी हरिदासांच्या ॥3॥ तुका ह्मणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥4॥ 1300 गंगा न देखे विटाळ । तें चि रांजणीं ही जळ ॥1॥ अल्पमहदा नव्हे सरी । विटाळ तो भेद धरी ॥ध्रु.॥ काय खंडिली भूमिका । वर्णा पायरिकां लोकां ॥2॥ तुका ह्मणे अगीविण । बीजें वेगळीं तों भिन्न ॥3॥ 1301 देवावरिल भार । काढूं नये कांहीं पर ॥1॥ तानभुके आठवण । घडे तें बरें चिंतन ॥ध्रु.॥ देखावी नििंश्चती । ते चि अंतर श्रीपती ॥2॥ वैभव सकळ । तुका मानितो विटाळ ॥3॥ 1302 थुंकोनियां मान । दंभ करितों कीर्तन ॥1॥ जालों उदासीन देहीं । एकाविण चाड नाहीं ॥ध्रु.॥ अर्थ अनर्थ सारिखा । करूनि ठेविला पारिखा ॥2॥ उपाधिवेगळा । तुका राहिला सोंवळा ॥3॥ 1303 काय हएाचें घ्यावें । नित्य नित्य कोणें गावें ॥1॥ केलें हरिकथेनें वाज । अंतरोनी जाते निज ॥ध्रु.॥ काम संसार । अंतरीं हे करकर ॥2॥ तुका ह्मणे हेंड । ऐसे मानिती ते लंड ॥3॥ 1304 वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मििश्रत ॥1॥ न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥ भांडार त्या दातियाचें। मी कैचें ये ठायीं ॥2॥ सादावीत गेला तुका । येथें एकाएकीं तो ॥3॥ 1305 ऐसी जिव्हा निकी । विठ्ठल विठ्ठल कां न घोकी ॥1॥ जेणें पाविजे उद्धार । तेथें राखावें अंतर ॥ध्रु.॥ गुंपोनि चावटी । तेथें कोणा लाभें भेटी ॥2॥ तुका ह्मणे कळा । देवाविण अमंगळा ॥3॥ 1306 साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥1॥ व्यभिचारा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥ शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥2॥ तुका ह्मणे जिणें । शर्त्तीविण लाजिरवाणें ॥3॥ 1307 मानामान किती । तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥1॥ जा रे चाळवीं बापुडीं । कोणी धरिती तीं गोडी ॥ध्रु.॥ रििद्धसिद्धी देसी। आह्मीं चुंभळें नव्हों तैसीं ॥2॥ तुका ह्मणे ठका । ऐसें नागविलें लोकां ॥3॥ 1308 पाहातोसी काय । आतां पुढें करीं पाय ॥1॥ वरि ठेवूं दे मस्तक । ठेलों जोडूनि हस्तक ॥ध्रु.॥ बरवें करीं सम । नको भंगों देऊं प्रेम ॥2॥ तुका ह्मणे चला । पुढती सामोरे विठ्ठला ॥3॥ 1309 भH ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारूनि ॥1॥ विषय तो त्यांचा जाला नारायण । नावडे धन जन माता पिता ॥ध्रु.॥ निर्वाणीं गोविंद असे मागेंपुढें । कांहीं च सांकडें पडों नेदी ॥2॥ तुका ह्मणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नकाऩ जाणें ॥3॥ 1310 तों च हीं क्षुल्लकें सखीं सहोदरें । नाहीं विश्वंभरें वोळखी तों ॥1॥ नारायण विश्वंभर विश्वपिता । प्रमाण तो होतां सकळ मिथ्या ॥ध्रु.॥ रवि नुगवे तों दीपिकाचें काज । प्रकाशें तें तेज सहज लोपे ॥2॥ तुका ह्मणे देहसंबंध संचितें । कारण निरुतें नारायणीं ॥3॥ 1311 यYा भूतांच्या पाळणा । भेद कारीये कारणा । पावावया उपासना । ब्रह्मस्थानीं प्रस्थान ॥1॥ एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तो चि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥ आवशक तो शेवट । मागें अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥2॥ तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥3॥ 1312 वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥1॥ तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥ यYााचा भोHा तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥2॥ वससी तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥3॥ तपतिर्थाटणें तुझे मूतिऩदान । तरि कां अभिमान आड येतो ॥4॥ आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥5॥ लोहागांवीं स्वामींच्या अंगावर ऊन पाणी घातलें - तो अभंग ॥1॥ 1313 जळे माझी काया लागला वोणवा । धांव रे केशवा मायबापा ॥1॥ पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें ॥ध्रु.॥ फुटोनियां दोन्ही भाग होऊं पाहे । पाहातोसी काय हृदय माझें ॥2॥ घेऊनि जीवन धांवें लवलाहीं । कवणाचें काहींहीं न चले येथें ॥3॥ तुका ह्मणे माझी तूं होसी जननी । आणीक निर्वाणीं कोण राखे ॥4॥ ॥1॥ 1314 अभH ब्राह्मण जळो त्याचें तोंड । काय त्यासी रांड प्रसवली ॥1॥ वैष्णव चांभार धन्य त्याची माता । शुद्ध उभयतां कुळ याती ॥ध्रु.॥ ऐसा हा निवाडा जालासे पुराणीं । नव्हे माझी वाणी पदरींची ॥2॥ तुका ह्मणे आगी लागो थोरपणा । दृिष्ट त्या दुर्जना न पडो माझी ॥3॥ नामदेव व पांडुरंग यांनी स्वप्नांत येऊन स्वामींस आYाा केली कीं कवित्व करणें - ते अभंग ॥2॥ 1315 नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥1॥ सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥ माप टाकी सळ धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥2॥ प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले शेवटीं लावी तुका ॥3॥ 1316 द्याल ठाव तरि राहेन संगती । संतांचे पंगती पायांपाशीं ॥1॥ आवडीचा ठाव आलोंसें टाकून । आतां उदासीन न धरावें ॥ध्रु.॥ सेवटील स्थळ निंच माझी वृित्त । आधारें विश्रांती पावइऩन ॥22॥ नामदेवापायीं तुक्या स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे ॥3॥ ॥2॥ 1317 त्रिपुटीच्या योगें । कांहीं नव्हे कोणां जोगें । एक जातां लागें । एक पाठीं लागतें ॥1॥ मागें पुढें अवघा काळ । पळों नये न चले बळ । करितां कोल्हाळ । कृपे खांदां हरि वाहे ॥ध्रु.॥ पापपुण्यात्मयाच्या शHी । असती योजिल्या श्रीपती । यावें काकुलती। तेथें सत्तानायेका ॥2॥ तुका उभा पैल थडी । तरि हे प्रकाश निवडी । घातल्या सांगडी । तापे पेटीं हाकारी ॥3॥ 1318 देखण्याच्या तीन जाती । वेठी वार्ता अत्यंतीं ॥1॥ जैसा भाव तैसें फळ । स्वातीतोय एक जळ ॥ध्रु.॥ पाहे सांगे आणि जेवी । अंतर महदांतर तेवी ॥2॥ तुका ह्मणे हिरा । पारखियां मूढां गारा ॥3॥ 1319 अनुभवें अनुभव अवघा चि साधिला । तरि िस्थरावला मनु ठायीं ॥1॥ पिटूनियां मुसे आला अळंकार । दग्ध तें असार होऊनियां ॥ध्रु.॥ एक चि उरलें कायावाचामना । आनंद भुवनामाजी त्रयीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जिंकिला संसार । होऊनि किंकर विठोबाचे ॥3॥ 1320 ऐसिया संपत्ती आह्मां संवसारी । भोगाचिया परि काय सांगों ॥1॥ काम तो कामना भोगीतसे देवा । आिंळगणें हेवा चरण चुंबीं ॥ध्रु.॥ शांतीच्या संयोगें निरसला ताप । दुसरें तें पाप भेदबुिद्ध ॥2॥ तुका ह्मणे पाहें तिकडे सारिखें । आपुलें पारिखें निरसलें ॥3॥ 1321 राम राज्य राम प्रजा लोकपाळ । एक चि सकळ दुजें नाहीं ॥1॥ मंगळावांचूनि उमटेना वाणी । अखंड चि खाणी एकी रासी ॥ध्रु.॥ मोडलें हें स्वामी ठावाठाव सेवा । वाढवा तो हेवा कोणा अंगें ॥2॥ तुका ह्मणे अवघें दुमदुमिलें देवें । उरलें तें गावें हें चि आतां ॥3॥ 1322 निवडोनि वाण काढिले निराळे । प्रमाण डोहळे यावरि ते ॥1॥ जयाचा विभाग तयासी च फळे । देखणें निराळें कौतुकासी ॥ध्रु.॥ शूर तो ओळखे घायडायहात । येरां होइल मात सांगायासी ॥2॥ तुका ह्मणे माझी केळवते वाणी । केला निजस्थानीं जाणवसा ॥3॥ 1323 याजसाटीं केला होता आटाहास्ये । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥1॥ आतां नििश्चतीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥ कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥2॥ ह्मणे मुिH परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥3॥ 1324 भHीचिया पोटीं रत्नाचिया खाणी । बह्मींची ठेवणी सकळ वस्तु ॥1॥ माउलीचे मागें बाळकांची हरी । एका सूत्रें दोरी ओढतसे ॥ध्रु.॥ जेथील जें मागे तें रायासमोर । नाहींसें उत्तर येत नाहीं ॥2॥ सेवेचिये सत्ते धनी च सेवक । आपुलें तें एक न वंची कांहीं ॥3॥ आदिअंताठाव असे मध्यभाग । भोंवतें भासे मग उंचासनी ॥4॥ भावारूढ तुका जाला एकाएकीं । देव च लौकिकीं अवघा केला ॥5॥ 1325 सांगतां दुर्लभ Yाानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥1॥ भजनाचे सोइऩ जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥ नाइकवे कानीं साधन उपाय । ऐकतो गाय हरुषें गीत ॥2॥ नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामिमना हरिकथेचा ॥3॥ काळाच्या साधना कोणा अंगीं बळ । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥4॥ तुका ह्मणे आह्मी खेळों भातुकुलें । विभागासी मुलें भोळीं येथें ॥5॥ 1326 जाणपण बरें देवाचे शिरीं । आह्मी ऐसीं बरीं नेणतीं च ॥1॥ देखणियांपुढें रुचे कवतुक । उभयतां सुख वाढतसे ॥ध्रु.॥ आशंकेचा बाधा नाहीं लडिवाळां । चित्त वरि खेळा समबुिद्ध ॥2॥ तुका ह्मणे दिशा मोकऑया सकळा । अवकाशीं खेळा ठाव जाला ॥3॥ 1327 वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥1॥ जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥ उदयीं च अस्त उदयो संपादला । कल्पनेचा केला जागेपणें ॥2॥ जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥3॥ स्वामीस संतांनीं पुसलें कीं तुह्मांस वैराग्य कोण्या प्रकारें जालें तें सांगा - ते अभंग ॥ 3 ॥ 1328 याति शूद्र वैश केला वेवसाव । आदि तो हा देव कुळपूज्य ॥1॥ नये बोलों परि पािळलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥ संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥2॥ दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥3॥ लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥4॥ देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥5॥ आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥6॥ कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥7॥ गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥8॥ संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥9॥ टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि ॥10॥ वचन मानिलें नाहीं सहुदाऩचें । समूळ प्रपंचें वीट आला ॥11॥ सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥12॥ मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥13॥ यावरि या जाली कवित्वाची स्फूतिऩ । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥14॥ निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥15॥ बुडविल्या वहएा बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥16॥ विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होइऩल उशीर आतां पुरे ॥17॥ आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥18॥ भHा नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥19॥ तुका ह्मणे माझें सर्व भांडवल । बोलविले पांडुरंगें ॥20॥ 1329 ऐका वचन हें संत । मी तों आगळा पतित । काय काजें प्रीत । करीतसां आदरें ॥1॥ माझें चित्त मज ग्वाही । सत्य तरलों मी नाहीं । एकांचिये वांहीं । एक देखीं मानिती ॥ध्रु.॥ बहु पीडिलों संसारें । मोडीं पुसें पिटीं ढोरें । न पडतां पुरें । या विचारें राहिलों ॥2॥ सहज सरलें होतें कांहीं । द्रव्य थोडें बहु तें ही । त्याग केला नाहीं । दिलें द्विजां याचकां ॥3॥ िप्रयापुत्रबंधु । यांचा तोडिला संबंधु । सहज जालों मंदु । भाग्यहीन करंटा ॥4॥ तोंड न दाखवे जना । शिरें सांदी भरें राणां । एकांत तो जाणां । तयासाटीं लागला ॥5॥ पोटें पिटिलों काहारें । दया नाहीं या विचारें । बोलावितां बरें । सहज ह्मणें यासाटीं ॥6॥ सहज वडिलां होती सेवा । ह्मणोनि पूजितों या देवा । तुका ह्मणे भावा । साटीं झणी घ्या कोणी ॥7॥ 1330 बरें जालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली ॥1॥ अनुतापें तुझें राहिलें चिंतन । जाला हा वमन संवसार ॥ध्रु.॥ बरें जालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ढोरें गुरें ॥3॥ बरें जालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा ॥4॥ बरें जालें तुझें केलें देवाइऩल । लेंकरें बाइऩल उपेिक्षलीं ॥5॥ तुका ह्मणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासीं जागरण ॥6॥ ॥3॥ 1331. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥1॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारी घेत नाहीं ॥ध्रु.॥ बंधनापासूनि उकलली गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥2॥ तुका ह्मणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोधें केलें घर रितें ॥3॥ 1332 मीचि मज व्यालों । पोटा आपुलिया आलों ॥1॥ आतां पुरले नवस । निरसोनी गेली आस ॥ध्रु.॥ जालों बरा बळी। गेलों मरोनि तेकाळीं ॥2॥ दोहींकडे पाहे । तुका आहे तैसा आहे ॥3॥ 1333 जग अवघें देव । मुख्य उपदेशाची ठेव ॥1॥ आधीं आपणयां नासी । तरि उतरे ये कसीं ॥ध्रु.॥ ब्रह्मYाानाचें कोठार । तें हें निश्चयें उत्तर ॥2॥ तुका ह्मणे ते उन्मनी । नास कारया कारणीं ॥3॥ 1334 साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥1॥ पिक्षयासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥ भHीची जोडी ते उखत्या चि साटीं । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥2॥ तुका ह्मणे आलें सांचत सांचणी । आजि जाली क्षणी एकसरें ॥33॥ 1335 नाहीं येथें वाणी । सकळां वणाअ घ्यावी धणी ॥1॥ जालें दर्पणाचें अंग । ज्याचा त्यासी दावी रंग ॥ध्रु.॥ एका भावाचा एकांत । पीक पिकला अनंत ॥2॥ तुका खळे दाणीं । करी बैसोनी वांटणी ॥3॥ 1336 ठेविलें जतन । करूनियां निज धन ॥1॥ जयापासाव उत्पित्त । तें हें बीज धरिलें हातीं ॥ध्रु.॥ निवडिलें वरळा भूस । सार आइन जिनस ॥2॥ तुका ह्मणे नारायण । भाग संचिताचा गुण ॥3॥ 1337 भ्रमना पाउलें वेचिलीं तीं वाव । प्रवेशतां ठाव एक द्वार ॥1॥ सार तीं पाउलें विठोबाचीं जीवीं । कोणीं न विसंभावीं क्षणभरि ॥ध्रु.॥ सुलभ हें केलें सकळां जीवन । काुंफ्कावें चि कान न लगेसें ॥2॥ तुका ह्मणे येथें सकळ ही कोड । पुरे मूळ खोड विस्ताराचें ॥3॥ 1338 कांहीं जाणों नये पांडुरंगाविण । पाविजेल सीण संदेहानें ॥1॥ भलतिया नावें आळविला पिता । तरि तो जाणता कळवळा ॥ध्रु.॥ अळंकार जातो गौरवितां वाणी । सर्वगात्रा धणी हरिकथा ॥2॥ तुका ह्मणे उपज विल्हाळे आवडी । करावा तो घडी घडी लाहो ॥3॥ 1339 बीजापोटीं पाहे फळ । विध न करितां सकळ ॥1॥ तया मूर्ख ह्मणावें वेडें । कैसें तुटेल सांकडें ॥ध्रु.॥ दावितिया वाट। वेठी धरूं पाहे चाट ॥2॥ पुढिल्या उपाया । तुका ह्मणे राखे काया ॥3॥ 1340 मातेचीं जो थानें फाडी । तया जोडी कोण ते ॥1॥ वेदां निंदी तो चांडाळ । भ्रष्ट सुतकिया खळ ॥ध्रु.॥ अगी लावी घरा । मग वसती कोठें थारा ॥2॥ तुका ह्मणे वर्म । येरा नाचवितो भ्रम ॥3॥ 1341 वेश वंदाया पुरते । कोण ब्राह्मण निरुते ॥1॥ ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु.॥ असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥2॥ तुका ह्मणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥3॥ 1342 ज्या ज्या आह्मांपाशीं होतील ज्या शिH । तेणें हा श्रीपती अळंकारूं ॥1॥ अवघा पायांपाशीं दिला जीवभाव । जन्ममरणाठाव पुसियेला ॥ध्रु.॥ ज्याचें देणें त्यासी घातला संकल्प। बंधनाचें पाप चुकविलें ॥2॥ तुका ह्मणे येथें उरला विठ्ठल । खाये बोले बोल गाये नाचे ॥3॥ 1343 आह्मी आळीकरें । प्रेमसुखाचीं लेंकुरें ॥1॥ पायीं गोविली वासना । तुश केलें ब्रह्मYााना ॥ध्रु.॥ येतां पाहें मुळा । वाट पंढरीच्या डोळां ॥2॥ तुका ह्मणे स्थळें । मग मी पाहेन सकळें ॥3॥ 1344 आइत्याची राशी । आली पाकसिद्धीपाशीं ॥1॥ आतां सांडोनि भोजन । भिके जावें वेडेपणें ॥ध्रु.॥ उसंतिली वाट । मागें परतावें फुकट ॥2॥ तुका ह्मणे वाणी । वेचों बैसोन ठाकणीं ॥3॥ 1345 धन्ये शुद्ध जाती । धरीं लौकरी परती ॥1॥ ऐकिलें तें चि कानीं । होय परिपाक मनीं ॥ध्रु.॥ कळवळा पोटीं । सावधान हितासाठीं ॥2॥ तुका ह्मणे भाव । त्याचा तो चि जाणां देव ॥3॥ 1346 जीवित्व तें किती । हें चि धरितां बरें चित्तीं ॥1॥ संत सुमनें उत्तरें । मृदु रसाळ मधुरें ॥ध्रु.॥ विसांवतां कानीं । परिपाक घडे मनीं ॥2॥ तुका ह्मणे जोडी । हाय जतन रोकडी ॥3॥ 1347 अभिमानाची स्वामिनी शांति । महkव घेती सकळ ॥1॥ कळोनि ही न कळे वर्म । तरि श्रम पावती ॥ध्रु.॥ सर्व सत्ता करितां धीर । वीर्यां वीर आगळा ॥2॥ तुका ह्मणे तिखट तिखें । मृदसखें आवडी ॥3॥ 1348 भोजन तें पाशांतीचें । निंचें उंचें उसाळी ॥1॥ जैशी कारंज्याची कळा । तो जिव्हाळा स्वहिता ॥ध्रु.॥ कल्पना ते देवाविण । न करी भिन्न इतरीं ॥2॥ तुका ह्मणे पावे भूती । ते नििंश्चती मापली ॥3॥ 1349 पोटापुरतें काम । परि अगत्य तो राम ॥1॥ कारण तें हें चि करीं । चित्तीं पांडुरंग धरीं ॥ध्रु.॥ प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ते सेवा ॥2॥ तुका ह्मणे बळ । बुद्धी वेचूनि सकळ ॥3॥ 1350 बहुतां जन्मां अंतीं । जोडी लागली हे हातीं ॥1॥ मनुष्यदेहा ऐसा ठाव । धरीं पांडुरंगीं भाव ॥ध्रु.॥ बहु केला फेरा । येथें सांपडला थारा ॥2॥ तुका ह्मणे जाणे । ऐसे भले ते शाहाणे॥3॥ 1351 रूप नांवें माया बोलावया ठाव । भागा आले भाव तयावरि ॥1॥ सींव वाटे परी न खंडे पृथिवी । शाहाणे ते जीवीं समजती ॥ध्रु.॥ पोटा आलें तिच्या लोळे मांडएांवरि । पारखी न करी खंतीं चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे भHीसाटीं हरिहर । अरूपीचें क्षरविभाग हें ॥3॥ 1352 लेकराची आळी न पुरवी कैसी । काय तयापाशीं उणें जालें ॥1॥ आह्मां लडिवाळां नाहीं तें प्रमाण । कांहीं ब्रह्मYाान आत्मिस्थति ॥ध्रु.॥ वचनाचा घेइऩन अनुभव पदरीं । जें हें जनाचारीं मिरवलें ॥2॥ तुका ह्मणे माझी भोिळवेची आटी । दावीन शेवटीं कौतुक हें ॥3॥ 1353 आर्तभूतांप्रति । उत्तम योजाव्या त्या शिH ॥1॥ फळ आणि समाधान । तेथें उत्तम कारण ॥ध्रु.॥ अल्पें तो संतोषी। स्थळीं सांपडे उदेसीं ॥2॥ सहज संगम । तुका ह्मणे तो उत्तम ॥3॥ 1354 मुळाचिया मुळें । दुःखें वाढती सकळे ॥1॥ ऐसा योगियांचा धर्म । नव्हे वाढवावा श्रम ॥ध्रु.॥ न कळे आवडी । कोण आहे कैसी घडी ॥2॥ तुका ह्मणे थीत । दुःख पाववावें चित्त ॥3॥ 1355 भाग्यवंतां हें चि काम । मापी नाम वैखरी ॥1॥ आनंदाची पुिष्ट अंगीं । श्रोते संगीं उद्धरती ॥ध्रु.॥ पिकविलें तया खाणें किती । पंगतीस सुकाळ ॥2॥ तुका करी प्रणिपात । दंडवत आचारियां ॥3॥ 1356 लटिकें तें रुचे । साच कोणां ही न पचे ॥1॥ ऐसा माजल्याचा गुण । भोगें कळों येइल सीण ॥ध्रु.॥ वाढवी ममता । नाहीं वरपडला तो दूतां ॥2॥ कांहीं न मनी माकड । तुका उपदेश हेकड ॥3॥ 1357 कौतुकाची सृष्टी । कौतुकें चि केलें कष्टी ॥1॥ मोडे तरी भलें खेळ । फांके फांकिल्या कोल्हाळ ॥ध्रु.॥ जाणणियासाटीं। भय सामावलें पोटीं ॥2॥ तुका ह्मणे चेता । होणें तें तूं च आइता ॥3॥ 1358 भोवंडींसरिसें । अवघें भोंवत चि दिसे ॥1॥ ठायीं राहिल्या निश्चळ । आहे अचळीं अचळ ॥ध्रु.॥ एक हाकेचा कपाटीं। तेथें आणीक नाद उठी ॥2॥ अभ्रें धांवे शशी । तुका असे ते तें दुसरें भासी ॥3॥ 1359 नव्हों आह्मी आजिकालीचीं । काचीं कुचीं चाळवणी ॥1॥ एके ठायीं मूळडाळ । ठावा सकळ आहेसी ॥ध्रु.॥ तुमचें आमचेंसें कांहीं । भिन्न नाहीं वांटलें ॥2॥ तुका ह्मणे जेथें असें । तेथें दिसें तुमचासा ॥3॥ 1360 योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीतिऩ सोहळा मान ॥1॥ येरयेरांवरी जायांचें उसिणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥ केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काव्हवितो ॥2॥ तुका ह्मणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥3॥ 1361 मरणा हातीं सुटली काया । विचारें या निश्चयें ॥1॥ नासोनियां गेली खंती । सहजिस्थति भोगाचे ॥ध्रु.॥ न देखें सें जालें श्रम । आलें वर्म हाता हें ॥2॥ तुका ह्मणे कैची कींव । कोठें जीव निराळा ॥3॥ 1362 नव्हे ब्रह्मचर्य बाइलेच्या त्यागें । वैराग्य वाउगें देशत्यागें ॥1॥ काम वाढे भय वासनेच्या द्वारें । सांडावें तें धीरें आचावाचे ॥ध्रु.॥ कांपवूनि टिरी शूरत्वाची मात । केलें वाताहात उचित काळें ॥2॥ तुका ह्मणे करी जिव्हेसी विटाळ । लटिक्याची मळ स्तुति होतां ॥3॥ 1363 नको सांडूं अन्न नको सेवूं वन । चिंतीं नारायण सर्व भोगीं ॥1॥ मातेचिये खांदीं बाळ नेणे सीण । भावना त्या भिन्न मुंडाविया ॥ध्रु.॥ नको गुंपों भोगीं नको पडों त्यागीं । लावुनि सरें अंगीं देवाचिया ॥2॥ तुका ह्मणे नको पुसों वेळोवेळां । उपदेश वेगळा उरला नाहीं ॥3॥ 1364 अवघी मिथ्या आटी । राम नाहीं तंव कंठीं ॥1॥ सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ध्रु.॥ सांडिलें तें मांडे। आघ्र उरल्या काळें दंडे ॥2॥ तुका ह्मणे आलें भागा । देउनि चिंतीं पांडुरंगा ॥3॥ 1365 न संगावें वर्म । जनीं असों द्यावा भ्रम ॥1॥ उगींच लागतील पाठीं । होतीं रितीं च हिंपुटीं ॥ध्रु.॥ सिकविल्या गोटी । शिकोनि धरितील पोटीं ॥2॥ तुका ह्मणे सीण । होइल अनुभवाविण ॥3॥ 1366 जातिविजातीची व्हावयासि भेटी । संकल्प तो पोटीं वाहों नये ॥1॥ होणार तें घडो होणाराच्या गुणें । होइल नारायणें निमिऩलें तें ॥ध्रु.॥ व्याघ्राचिये भुके वधावी ते गाय । याचें नांव काय पुण्य असे ॥2॥ तुका ह्मणे न करी विचार पुरता । गरज्याची माता पिता खर ॥3॥ 1367 शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥1॥ उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥ फांसावेना तरिं दुःख घेतें वाव । मग होतो जीव कासावीस ॥2॥ तुका ह्मणे नको राग धरूं झोंडा । नुघडितां पीडा होइल डोळे ॥3॥ 1368 अभिन्नव सुख तरि या विचारें । विचारावें बरें संतजनीं ॥1॥ रूपाच्या आठवें दोन्ही ही आपण । वियोगें तो क्षीण होत नाहीं ॥ध्रु.॥ पूजा तरि चित्तें कल्पा तें ब्रह्मांड । आहाच तो खंड एकदेसी ॥2॥ तुका ह्मणे माझा अनुभव यापरि । डोइऩ पायांवरि ठेवीतसें ॥3॥ 1369 नटनाटए तुह्मी केलें याच साटीं । कवतुकें दृष्टी निववावी ॥1॥ नाहीं तरि काय कळलें चि आहे । वाघ आणि गाय लांकडाची ॥ध्रु.॥ अभेद चि असे मांडियेलें खेळा । केल्या दीपकळा बहुएकी ॥2॥ तुका ह्मणे रूप नाहीं दर्पणांत । संतोषाची मात दुसरें तें ॥3॥ 1370 रवीचा प्रकाश । तो चि निशी घडे नाश । जाल्या बहुवस । तरि त्या काय दीपिका ॥1॥ आतां हा चि वसो जीवीं । माझे अंतरी गोसावीं । होऊं येती ठावीं । काय वर्में याच्यानें ॥ध्रु.॥ सवें असतां धणी । आड येऊं न सके कोणी । न लगे विनवणी । पृथकाची करावी ॥2॥ जन्माचिया गति । येणें अवघ्या खुंटती । कारण ते प्रीति । तुका ह्मणे जवळी ॥3॥ 1371 ऐसे सांडुनियां घुरे । किविलवाणी दिसां कां रे । कामें उर भरे । हातीं नुरे मृित्तका ॥1॥ उदार हा जगदानी । पांडुरंग अभिमानी । तुळसीदळ पाणी । चिंतनाचा भुकेला ॥ध्रु.॥ न लगे पुसावी चाकरी । कोणी वकील ये घरीं । त्याचा तो चाकरी । पारपत्य सकळ ॥2॥ नाहीं आडकाटी । तुका ह्मणे जातां भेटी । न बोलतां मिठी । उगी च पायीं घालावी ॥3॥ 1372 उपकारी असे आरोणि उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥1॥ लाभावरि घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥ जीवा ऐसें देखे आणिकां जीवांसी । निखळ चि रासि गुणांची च ॥2॥ तुका ह्मणे देव तयांचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥3॥ 1373 कोणा पुण्यें यांचा होइऩन सेवक । जींहीं द्वंदादिक दुराविलें ॥1॥ ऐसें वर्म मज दावीं नारायणा । अंतरीं च खुणा प्रकटोनि ॥ध्रु.॥ बहु अवघड असे संतभेटी । तरि जगजेठी करुणा केली ॥2॥ तुका ह्मणे मग नयें वृत्तीवरी । सुखाचे शेजारीं पहुडइऩन ॥3॥ 1374 क्षणक्षणां सांभािळतों । साक्षी होतों आपुला ॥1॥ न घडावी पायीं तुटी । मन मुठी घातलें ॥ध्रु.॥ विचारतों वचनां आधीं । धरूनि शुद्धी ठेविली ॥2॥ तुका ह्मणे मागें भ्यालों ॥ तरीं जालों जागृत ॥3॥ 1375 आणूनियां मना । आवघ्या धांडोिळल्या खुणा । देखिला तो राणा । पंढरपूरनिवासी ॥1॥ यासी अनुसरल्या काय । घडे ऐसें वांयां जाय । देखिले ते पाय । सम जीवीं राहाती ॥ध्रु.॥ तो देखावा हा विध । चिंतनें तें कार्य सिद्ध । आणिकां संबंध । नाहीं पर्वकाळासी ॥2॥ तुका ह्मणे खळ । हो क्षणें चि निर्मळ । जाऊनियां मळ । वाळवंटीं नाचती ॥3॥ 1376 धरितां ये पंढरीची वाट । नाहीं संकट मुHीचें ॥1॥ वंदूं येती देव पदें । त्या आनंदें उत्साहें ॥ध्रु.॥ नृत्यछंदें उडती रज । जे सहज चालतां ॥2॥ तुका ह्मणे गरुड टके । वैष्णव निके संभ्रम ॥3॥ 1377 नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृत चि जरवे । होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥1॥ मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं िस्थरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥ध्रु.॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें। अंगा येती उद्गार ॥2॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा । तुका ह्मणे लेखा । आतां नाहीं आनंदा ॥3॥ 1378 रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥1॥ काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतितां विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥ करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥2॥ तुका ह्मणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥3॥ 1379 वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि ॥1॥ विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगती ॥ध्रु.॥ वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥2॥ तुका ह्मणे दुिश्चत नका । राहों फुका नाड हा ॥3॥ 1380 आणीक ऐसें कोठें सांगा । पांडुरंगा सारिखें ॥1॥ दैवत ये भूमंडळीं । उद्धार कळी पावितें ॥ध्रु.॥ कोठें कांहीं कोठें कांहीं । शोध ठायीं स्थळासी ॥2॥ आनेत्रींचें तीथाअ नासे । तीथाअ वसे वज्रलेप ॥3॥ पांडुरंगींचें पांडुरंगीं । पाप अंगीं राहेना ॥4॥ ऐसें हरें गिरिजेप्रति । गुहए िस्थती सांगितली ॥5॥ तुका ह्मणे तीर्थ क्षेत्र । सर्वत्र हें दैवत ॥6॥ 1381 पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥1॥ नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥ भावें घ्या रे भावें घ्या रे । येगदा जा रे पंढरिये ॥2॥ भाग्यें आलेति मनुष्यदेहा । तो हा पाहा विठ्ठल ॥3॥ पापपुण्या करील झाडा । जाइल पीडा जन्माची ॥4 ॥ घ्यावी हातीं टाळदिंडी । गावे तोंडीं गुणवाद ॥5॥ तुका ह्मणे घटापटा । न लगे वाटा शोधाव्या ॥6॥ 1382 कर्म धर्म नव्हती सांग । उण्या अंगें पतन ॥1॥ भलत्या काळें नामावळी । सुलभ भोळी भाविकां ॥ध्रु.॥ प्रायिश्चत्तें पडती पायां । गाती तयां वैष्णवां ॥2॥ तुका ह्मणे नुपजे दोष करा घोष आनंदे ॥3॥ 1383 पाहा रे हें दैवत कैसें । भिHपिसें भाविक ॥1॥ पाचारिल्या सरिसें पावे । ऐसें सेवे बराडी ॥ध्रु.॥ शुल्क काष्ठीं गुरुगुरी । लाज हरि न धरी ॥2॥ तुका ह्मणे अर्धनारी । ऐसीं धरी रूपडीं ॥3॥ 1384 बहुत सोसिले मागें न कळतां । पुढती काय आतां अंध व्हावें ॥1॥ एकाचिये अंगीं हें ठेवावें लावून । नये भिन्न भिन्ना चांचपडो ॥ध्रु.॥ कोण होइऩल तो ब्रह्मांडचाळक । आपणें चि हाके देइऩल हाके ॥2॥ तुका ह्मणे दिलीं चेतवूनि सुणीं । कौतुकावांचूनि नाहीं छळ ॥3॥ 1385 आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचें । कैसें दिलें साचें करोनियां ॥1॥ दुजियासी तंव अकळ हा भाव । करावा तो जीव साक्ष येथें ॥ध्रु.॥ एकीं अनेकत्व अनेकीं एकत्व । प्रकृतिस्वभाव प्रमाणें चि ॥2॥ तुका ह्मणे करूं उगवूं जाणसी । कुशळ येविशीं तुह्मी देवा ॥3॥ 1386 अस्त नाहीं आतां एक चि मोहोरा । पासूनि अंधारा दुरि जालों ॥1॥ साक्षत्वें या जालों गुणाचा देखणा । करीं नारायणा तरी खरें ॥ध्रु.॥ आठवें विसरु पडियेला मागें । आलें तें चि भागें यत्न केलें ॥2॥ तुका ह्मणे माझा विनोद देवासी । आह्मी तुह्मां ऐसीं दोन्ही नव्हों ॥3॥ 1387 क्षर अक्षर हे तुमचे विभाग । कासयानें जग दुरी धरा ॥1॥ तैसे आह्मी नेणों पालटों च कांहीं । त्यागिल्याची नाहीं मागें चाड ॥ध्रु.॥ प्रतिपादिता तूं समविषमाचा । प्रसाद तो याचा पापपुण्य ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां नाना अवगणीं । लागे संपादणी लटिक्याची ॥3॥ 1388 सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥1॥ गोत पति विश्वंभरीं । जाला हरि सोयरा ॥ध्रु.॥ वोळखी ते एका नांवें । इतरभावें खंडणा ॥2॥ तुका ह्मणे नांवें रूपें । दुसरीं पापें हारपलीं ॥3॥ 1389 मीं हें ऐसें काय जाती । अवघड किती पाहातां ॥1॥ नाहीं होत उल्लंघन । नसतां भिन्न दुसरें ॥ध्रु.॥ अंधारानें तेज नेलें। दृष्टीखालें अंतर ॥2॥ तुका ह्मणे सवें देव । घेतां ठाव दावील ॥3॥ 1390 कवेश्वरांचा तो आह्मांसी विटाळ । प्रसाद वोंगळ चिवडिती ॥1॥ दंभाचे आवडी बहिराट अंधळे । सेवटासि काळें होइल तोंड ॥ध्रु.॥ सोन्यासेजारी तों लाखेची जतन । सतंत ते गुण जैसेतैसे ॥2॥ सेव्य सेववता न पडतां ठावी । तुका ह्मणे गोवी पावती हीं ॥3॥ 1391 वाढलियां मान न मनावी नििश्चती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥1॥ ह्मणऊनि मना लावावी कांचणी । इंिद्रयांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥ एका एकपणें एकाचिये अंगीं । लागे रंग रंगीं मिळलिया ॥2॥ तुका ह्मणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥3॥ 1392 माया साक्षी आह्मी नेणों भीड भार । आप आणि पर नाहीं दोन्ही ॥1॥ सत्याचिये साटीं अवघा चि भरे । नावडे व्यापार तुटीचा तो ॥ध्रु.॥ पोंभािळता चरे अंतरींचें दुःख । लांसें फांसें मुख उघडावें ॥2॥ तुका ह्मणे नव्हे स्फीतीचा हा ठाव । निवाडएासी देव साक्षी केला ॥3॥ 1393 संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥1॥ परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥ केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नासा मूळ ॥2॥ तुका ह्मणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥3॥ 1394 संतांच्या धीकारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥1॥ कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥ मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥2॥ तुका ह्मणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तइऩ अवघें बरें ॥3॥ 1395 ओलें मूळ भेदी खडकाचें अंग । आभ्यासासी सांग कार्यसििद्ध ॥1॥ नव्हे ऐसें कांहीं नाहीं अवघड । नाहीं कइऩवाड तोंच वरि ॥ध्रु.॥ दोरें चिरा कापे पडिला कांचणी । अभ्यासें सेवनीं विष पडे ॥2॥ तुका ह्मणे कैंचा बैसण्यासी ठाव । जठरीं बाळा वाव एकाएकीं ॥3॥ 1396 अमर आहां अमर आहां । खरें कीं पाहा खोटें हें ॥1॥ न ह्मणां देह माझा ऐसा । मग भरवसा कळेल ॥ध्रु.॥ कैंचा धाक कैंचा धाक । सकिळक हें आपुलें ॥2॥ देव चि बरे देव चि बरे । तुका ह्मणे खरे तुह्मी ॥3॥ 1397 काम नाहीं काम नाहीं । जालों पाहीं रिकामा ॥1॥ फावल्या या करूं चेष्टा । निश्चळ दृष्टा बैसोनि ॥ध्रु.॥ नसत्या छंदें नसत्या छंदें । जग विनोदें वि†हडतसे ॥2॥ एकाएकीं एकाएकीं । तुका लोकीं निराळा ॥3॥ 1398 हातीं घेऊनियां काठी । तुका लागला किळवरा पाठी ॥1॥ नेऊनि निजविलें स्मशानीं । माणसें जाळी ते ठाकणीं ॥ध्रु.॥ काडिलें तें ओढें । मागील उपचाराचें पुढें ॥2॥ नाहीं वाटों आला भेव । सुख दुःख भोगिता देव ॥3॥ याजसाटीं हें निर्वाण । केलें कसियेलें मन ॥4॥ तुका ह्मणे अनुभव बरा । नाहीं तरी सास्त होय चोरा ॥5॥ 1399 कीर्तन चांग कीर्तन चांग । होय अंग हरिरूप ॥1॥ प्रेमाछंदें नाचे डोले । हारपला देहभाव ॥ध्रु.॥ एकदेशीं जीवकळा। हा सकळां सोयरा ॥2॥ तुका ह्मणे उरला देव । गेला भेव त्या काळें ॥3॥ 1400 न बोलेसी करा वाचा । उपाधीचा संबंध ॥1॥ एका तुमच्या नामाविण । अवघा सीण कळतसे ॥ध्रु.॥ संकल्पाचे ओढी मन । पापपुण्य सम चि ॥2॥ तुका ह्मणे नारायणीं । पावो वाणी विसांवा ॥3॥ 1401 प्रारब्धा हातीं जन । सुख सीण पावतसे ॥1॥ करितां घाइऩळाचा संग । अंगें अंग माखावें ॥ध्रु.॥ आविसा अंगें पीडा वसे । त्यागें असे बहु सुख ॥2॥ तुका ह्मणे जीव भ्याला । अवघ्या आला बाहेरी ॥3॥ 1402 आशा ते करविते बुद्धीचा लोप । संदेह तें पाप कैसें नव्हे ॥1॥ आपला आपण करावा विचार । प्रसन्न तें सार मन गोही ॥ध्रु.॥ नांवें रूपें अंगीं लाविला विटाळ । होतें त्या निर्मळ शुद्ध बुद्ध ॥2॥ अंधऑयानें नये देखण्याची चाली । चालों ऐसी बोली तुका बोले ॥3॥ 1403 जळो आतां नांव रूप । माझें पाप गांठींचें ॥1॥ संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु.॥ लटिकियाचा अभिमान । होता सीण पावित ॥2॥ तुका ह्मणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥3॥ 1404 निंदा स्तुती करवी पोट । सोंग दाखवी बोभाट ॥1॥ जटा राख विटंबना । धीर नाहीं क्षमा मना ॥ध्रु.॥ शृंगारिलें मढें । जीवेंविण जैसें कुडें ॥2॥ तुका ह्मणे रागें । भलतें चावळे वाउगें ॥3॥ 1405 भिIयापत्र अवलंबणें । जळो जिणें लाजिरवाणें । ऐसियासी नारायणें । उपेक्षीजे सर्वथा ॥1॥ देवा पायीं नाहीं भाव। भिH वरी वरी वाव । समपिऩला जीव । नाहीं तो हा व्यभिचार ॥ध्रु.॥ जगा घालावें सांकडें । दीन होऊनि बापुडें । हें चि अभाग्य रोकडें । मूळ आणि विश्वास ॥2॥ काय न करी विश्वंभर । सत्य करितां निर्धार । तुका ह्मणे सार । दृढ पाय धरावे ॥3॥ 1406 भावबळें विष्णुदास । नाहीं नास पावत ॥1॥ योगभाग्यें घरा येती । सर्व शिH चालत ॥ध्रु.॥ पित्याचें जें काय धन । पुत्रा कोण वंचील ॥2॥ तुका ह्मणे कडे बैसों । तेणें असों निर्भर ॥3॥ 1407 कोरडएा गोठी चटक्या बोल । शिकल्या सांगे नाहीं ओल ॥1॥ कोण यांचें मना आणी । ऐकों कानीं नाइकोनि ॥ध्रु.॥ घरोघरीं सांगती Yाान । भूस सिणें कांडिती ॥2॥ तुका ह्मणे आपुल्या मति । काय रितीं पोकळें ॥3॥ 1408 नव्हतियाचा सोस होता । झडो आतां पदर ॥1॥ देखणें तें देखियेलें । आतां भलें सािक्षत्वें ॥ध्रु.॥ लाभें कळों आली हानि । राहों दोन्हीं निराळीं ॥2॥ तुका ह्मणे एकाएकीं । हा कां लोकीं पसारा ॥3॥ 1409 सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥1॥ ऐसें बरवें वचन । करितां तें नारायण ॥ध्रु.॥ असे प्रारब्ध नेमें । श्रमुचि उरे श्रम ॥2॥ सुख देते शांती । तुका ह्मणे धरितां चित्तीं ॥3॥ 1410 काय शरीरापें काम । कृपा साधावया प्रेम । उचिताचे धर्म । भागा आले ते करूं ॥1॥ देइऩन हाक नारायणा । तें तों नाकळे बंधना । पंढरीचा राणा । आइकोन धांवेल ॥ध्रु.॥ सातांपांचांचें गोठलें । प्रारब्धें आकारलें । आतां हें संचलें । असो भोगा सांभाळीं ॥2॥ फावली ते बरवी संधि । सावधान करूं बुद्धी । तुका ह्मणे मधीं । कोठें नेघें विसावा ॥3॥ 1411 न लगे देशकाळ । मंत्रविधानें सकळ । मनें चि निश्चळ । करूनि करुणा भाकावी ॥1॥ येतो बैसलिया ठाया । आसणें व्यापी देवराया । निर्मळ ते काया । अधिष्ठान तयाचें ॥ध्रु.॥ कल्पनेचा साक्षी । तरि आदरें चि लक्षी । आवडीनें भक्षी । कोरडें धान्य मटमटां ॥2॥ घेणें तरि भाव । लक्षी दासांचा उपाव। तुका ह्मणे जीव । जीवीं मेळविल अनंत ॥3॥ 1412 नाहीं आलें भिHसुख अनुभवा । तो मी Yाान देवा काय करूं ॥1॥ नसावें जी तुह्मी कांहीं नििंश्चतीनें । माझिया वचनें अभेदाच्या ॥ध्रु.॥ एकाएकीं मन नेदी समाधान । देखिल्या चरण वांचूनियां ॥2॥ तुका ह्मणे वाचा गुणीं लांचावली । न राह उगली मौन्य मज ॥3॥ 1413 मागतां विभाग । कोठें लपाल जी मग ॥1॥ संत साक्षी या वचना । त्यांसी ठाउकिया खुणा ॥ध्रु.॥ होइन धरणेकरी। मग मी रिघों नेदीं बाहेरी ॥2॥ तुका ह्मणे मी अक्षर । तुज देवपणाचा भार ॥3॥ 1414 मिटवण्याचे धनी । तुम्ही वेवसाय जनीं ॥1॥ कोण पडे ये लिगाडीं । केली तैसीं उगवा कोडीं ॥ध्रु.॥ केलें सांगितलें काम । दिले पाळूनियां धर्म ॥2॥ तुका ह्मणे आतां । असो तुमचें तुमचे माथां ॥3॥ 1415 समपिऩली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥1॥ पूजा होते मुHाफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥ धार अखंडित । ओघ चालियेला नित ॥2॥ पूर्णाहुति जीवें । तुका घेऊनि ठेला भावें ॥3॥ 1416 अवघा चि आकार ग्रासियेला काळें । एक चि निराळें हरिचें नाम ॥1॥ धरूनि राहिलों अविनाश कंठीं । जीवन हें पोटीं सांटविलें ॥ध्रु.॥ शरीरसंपित्त मृगजळभान । जाइऩल नासोन खरें नव्हे ॥2॥ तुका ह्मणे आतां उपाधीच्या नांवें । आणियेला देवें वीट मज ॥3॥ 1417 बोलणें चि नाहीं । आतां देवाविण कांहीं ॥1॥ एकसरें केला नेम । देवा दिले क्रोध काम ॥ध्रु.॥ पाहेन ते पाय । जोंवरि हे दृिष्ट धाय ॥2॥ तुका ह्मणे मनें । हे चि संकल्प वाहाणें ॥3॥ 1418 येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥1॥ उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥ आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥2॥ तुका ह्मणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥3॥ 1419 भरला दिसे हाट । अवघी वाढली खटपट । संचिताचे वाट । वाटाऊनि फांकती ॥1॥ भोगा ऐसे ठायाठाव । कर्मा त्रिविधाचे भाव । द्रष्टा येथें देव । विरहित संकल्पा ॥ध्रु.॥ दिला पाडूनियां धडा । पापपुण्यांचा निवाडा । आचरती गोडा । आचरणें आपुलाल्या ॥2॥ तुका ह्मणे पराधीनें । जालीं ओढलिया ॠणें । तुटती बंधनें । जरि देवा आळविते ॥3॥ 1420 आला भागासी तो करीं वेवसाव । परि राहो भाव तुझ्या पायीं ॥1॥ काय चाले तुह्मीं बांधलें दातारा । वाहिलिया भारा उसंतितों ॥ध्रु.॥ शरीर तें करी शरीराचे धर्म । नको देऊं वर्म चुकों मना ॥2॥ चळण फिरवी ठाव बहुवस । न घडो आळस चिंतनाचा ॥3॥ इंिद्रयें करोत आपुले व्यापार । आवडीसी थार देइप पायीं ॥4॥ तुका ह्मणे नको देऊं काळा हातीं । येतों काकुलती ह्मणऊनि ॥5॥ 1421 आह्मां अवघें भांडवल । येथें विठ्ठल एकला ॥1॥ कायावाचामनोभावें । येथें जीवें वेचलों ॥ध्रु.॥ परतें कांहीं नेणें दुजें। तkवबीजें पाउलें ॥2॥ तुका ह्मणे संतसंगें । येणें रंगें रंगलों ॥3॥ 1422 साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार ख†या मोलें ॥1॥ भोगाचे सांभाळीं द्यावें किळवर । संचित चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥ महkवाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥2॥ तुका ह्मणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तें चि व्हावें ॥3॥ 1423 निर्वैर होणें साधनाचें मूळ । येर ते विल्हाळ सांडीमांडी ॥1॥ नाहीं चालों येती सोंगसंपादणी । निवडे अवसानीं शुद्धाशुद्ध ॥ध्रु.॥ त्यागा नांव तरी निविऩषयवासना । कारीयेकारणांपुरते विधि ॥2॥ तुका ह्मणे राहे चिंतनीं आवडी । येणें नांवें जोडी सत्यत्वेंशीं ॥3॥ 1424 पशु ऐसे होती Yाानी । चर्वणीं या विषयांचे ॥1॥ ठेवूनियां लोभीं लोभ । जाला क्षोभ आत्मत्वीं ॥ध्रु.॥ केला आणिकां वाढी पाक । खाणें ताक मूर्खासी ॥2॥ तुका ह्मणे मोठा घात । वाताहात हा देह ॥3॥ 1425 कां जी धरिलें नाम । तुह्मी असोनि निष्काम ॥1॥ कोणां सांगतसां Yाान । ठकाठकीचें लक्षण ॥ध्रु.॥ आवडीनें नाचें। आहे तरी पुढें साचें ॥2॥ तुका ह्मणे प्रेम । नाहीं भंगायाचें काम ॥3॥ 1426 खरें बोले तरी । फुकासाठीं जोडे हरी ॥1॥ ऐसे फुकाचे उपाय । सांडूनियां वांयां जाय ॥ध्रु.॥ परउपकार । एका वचनाचा फार ॥2॥ तुका ह्मणे मळ । मनें सांडितां शीतळ ॥3॥ 1427 दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥1॥ पावे धांवोनियां घरा । राहे धरोनियां थारा ॥ध्रु.॥ कीर्तनाचे वाटे । बराडिया ऐसा लोटे ॥2॥ तुका ह्मणे घडे । पूजा नामें देव जोडे ॥3॥ 1428 शिष्यांची जो नेघे सेवा । मानी देवासारिखें ॥1॥ त्याचा फळे उपदेश । आणिकां दोष उफराटे ॥ध्रु.॥ त्याचें खरें ब्रह्मYाान । उदासीन देहभावीं ॥2॥ तुका ह्मणे सत्य सांगें । योत रागें येती ते ॥3॥ 1429 माझी मेलीं बहुवरिं । तूं कां जैसा तैसा हरी ॥1॥ विठो कैसा वांचलासि । आतां सांग मजपाशीं ॥ध्रु.॥ तुज देखतां चि माझा । बाप मेला आजा पणजा ॥2॥ आह्मां लागलेंसे पाठी । बालत्व तारुण्यें काठीं ॥3॥ तुज फावलें तें मागें । कोणी नसतां वादिलागें ॥4॥ तुका ह्मणे तुझ्या अंगीं । मज देखिल लागलीं औघीं ॥5॥ 1430 आणीक कोणाचा न करीं मी संग । जेणें होय भंग माझ्या चित्ता ॥1॥ विठ्ठलावांचूनि आणीक जे वाणी । नाइकें मी कानीं आपुलिया ॥ध्रु.॥ समाधानासाटीं बोलावी हे मात । परि माझें चित्त नाहीं कोठें ॥2॥ जिवाहूनि मज ते चि आवडती । आवडे ज्या चित्तीं पांडुरंग ॥3॥ तुका ह्मणे माझें तो चि जाणे हित । आणिकांच्या चित्त नेदीं बोला ॥4॥ 1431 आशा हे समूळ खाणोनि काडावी । तेव्हां चि गोसावी व्हावें तेणें ॥1॥ नाहीं तरी सुखें असावें संसारीं । फजिती दुसरी करूं नये ॥ध्रु.॥ आशा मारूनिया जयवंत व्हावें । तेव्हां चि निघावें सर्वांतूनि ॥2॥ तुका ह्मणे जरीं योगाची तांतडी । आशेची बीबुडी करीं आधीं ॥3॥ 1432 निष्ठावंत भाव भHांचा स्वधर्म । निर्धार हें वर्म चुकों नये ॥1॥ निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास । पाहों नये वास आणिकांची ॥2॥ तुका ह्मणे ऐसा कोणें उपेिक्षला । नाहीं ऐकिला ऐसा कोणीं ॥3॥ 1433 नामाचें चिंतन प्रगट पसारा । असाल तें करा जेथें तेथें ॥1॥ सोडवील माझा स्वामी निश्चयेसीं । प्रतिYाा हे दासीं केली आह्मीं ॥ध्रु.॥ गुण दोष नाहीं पाहात कीर्तनीं । प्रेमें चक्रपाणी वश्य होय ॥2॥ तुका ह्मणे कडु वाटतो प्रपंच । रोकडे रोमांच कंठ दाटे ॥3॥ 1434 नाम ह्मणतां मोक्ष नाहीं । ऐसा उपदेश करिती कांहीं । बधिर व्हावें त्याचे ठायीं । दुष्ट वचन वाक्य तें ॥1॥ जयाचे राहिलें मानसीं । तें चि पावले तयासी । चांचपडतां मेलीं पिसीं । भलतैसीं वाचाळें ॥ध्रु.॥ नवविधीचा निषेध । जेणें मुखें करिती वाद । जन्मा आले निंद्य । शूकरयाती संसारा ॥2॥ काय सांगों वेळोवेळां । आठव नाहीं चांडाळा । नामासाठीं बाळा । क्षीरसागरीं कोंडिलें ॥3॥ आपुलिया नामासाठीं । लागे शंखासुरापाठीं। फोडोनियां पोटीं । वेद चारी काढिले ॥4॥ जगीं प्रसिद्ध हे बोली। नामें गणिका तारिली । आणिकें ही उद्धरिलीं । पातकी महादोषी ॥5॥ जे हे पवाडे गर्जती । नाम प्रल्हादाचा चित्तीं । जळतां बुडतां घातीं । राखे हातीं विषाचे ॥6॥ काय सांगों ऐशीं किती । तुका ह्मणे नामख्याती । नरकाप्रती जाती । निषेधिती तीं एकें ॥7॥ 1435 किती या काळाचा सोसावा वळसा । लागला सरिसा पाठोवाठीं ॥1॥ लक्ष चौ†याशीची करा सोडवण । रिघा या शरण पांडुरंगा ॥ध्रु.॥ उपजल्या पिंडा मरण सांगातें । मरतें उपजतें सवें चि तें ॥2॥ तुका ह्मणे माळ गुंतली राहाटीं । गाडग्याची सुटी फुटलिया ॥3॥ 1436 गासी तरि एक विठ्ठल चि गाइप । नाहीं तरि ठायीं राहें उगा ॥1॥ अद्वैतीं तों नाहीं बोलाचें कारण । जाणीवेचा श्रम करिसी वांयां ॥2॥ तुका ह्मणे किती करावी फजिती । लाज नाहीं नीतिं निलाजिरा ॥3॥ 1437 जयाचिये वाचे नये हा विठ्ठल । त्याचे मज बोल नावडती ॥1॥ शत्रु तो म्यां केला न ह्मणें आपुला । जो विन्मुख विठ्ठला सर्वभावें ॥2॥ जयासी नावडे विठोबाचें नाम । तो जाणा अधम तुका ह्मणे ॥3॥ 1438 आह्मांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥1॥ घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड किळकाळासी ॥ध्रु.॥ अबद्ध वांकडें जैशातैशा परी । वाचे हरि हरि उच्चारावें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां सांपडलें निज । सकळां हें बीज पुराणांचें ॥3॥ 1439 जीव तो चि देव भोजन ते भिH । मरण तेचि मुिH पापांडएाची ॥1॥ पिंडाच्या पोषकी नागविलें जन । लटिकें पुराण केलें वेद ॥ध्रु.॥ मना आला तैसा करिती विचार । ह्मणती संसार नाहीं पुन्हा ॥2॥ तुका ह्मणे पाठीं उडती यमदंड । पापपुण्य लंड न विचारी ॥3॥ 1440 भHांचा महिमा भH चिं जाणती । दुर्लभ या गति आणिकांसी ॥1॥ जाणोनि नेणते जाले तेणें सुखें । नो बोलोनि मुखें बोलताती ॥ध्रु.॥ अभेदूनि भेद राखियेला अंगीं । वाढावया जगीं प्रेमसुख ॥2॥ टाळ घोष कथा प्रेमाचा सुकाळ । मूढ लोकपाळ तरावया ॥3॥ तुका ह्मणे हें तों आहे तयां ठावें । जिहीं एक्या भावें जाणीतलें ॥4॥ 1441 आशा तृष्णा माया अपमानाचें बीज । नासिलिया पूज्य होइऩजेतें ॥1॥ अधीरासी नाहीं चालों जातां मान । दुर्लभ दरुषण धीर त्याचें ॥2॥ तुका ह्मणे नाहीं आणिकांसी बोल । वांयां जाय मोल बुद्धीपाशीं ॥3॥ 1442 चिंतनें सरे तो धन्य काळ । सकळ मंगळ मंगळांचें ॥1॥ संसारसिंधु नाहीं हरिदासा । गर्भवास कैसा नेणती ते ॥ध्रु.॥ जनवन ऐसें कृपेच्या सागरें । दाटला आभारें पांडुरंग ॥2॥ तुका ह्मणे देवा भHांचे बंधन । दाखविलें भिन्न परी एक ॥3॥ 1443 मोक्षाचें आह्मांसी नाहीं अवघड । तो असे उघाड गांठोळीस ॥1॥ भHीचे सोहळे होतील जीवासी । नवल तेविशीं पुरवितां ॥ध्रु.॥ ज्याचें त्यासी देणें कोण तें उचित । मानूनियां हित घेतों सुख ॥2॥ तुका ह्मणे सुखें देइप संवसार । आवडीसी थार करीं माझे ॥3॥ ॥12॥ 1444 चिंतनासी न लगे वेळ । सर्व काळ करावें ॥1॥ सदा वाचे नारायण । तें वदन मंगळ ॥ध्रु.॥ पढिये सवाौत्तमा भाव । येथें वाव पसारा ॥2॥ ऐसें उपदेशी तुका । अवघ्या लोकां सकळां ॥3॥ 1445 अंतराय पडे गोविंदीं अंतर । जो जो घ्यावा भार तो चि बाधी ॥1॥ बैसलिये ठायीं आठवीन पाय । पाहीन तो ठाय तुझा देवा ॥ध्रु.॥ अखंड तें खंडे संकल्पीं विकल्प । मनोजन्य पाप रज्जुसर्प ॥2॥ तुका ह्मणे विश्वीं विश्वंभर वसे । राहों ऐसे दशे सुखरूप ॥3॥ 1446 एकाचिया घाटएा टोके । एक फिके उपचार ॥1॥ ऐसी सवे गोविळया । भाव तया पढियंता ॥ध्रु.॥ एकाचेथें उिच्छष्ट खाय । एका जाय ठकोणि ॥2॥ तुका ह्मणे सोपें । बहु रूपें अनंत ॥3॥ 1447 कोठें नाहीं अधिकार । गेले नर वांयां ते ॥1॥ ऐका हें सोपें वर्म । न लगे श्रम चिंतना ॥ध्रु.॥ मृत्याचिये अंगीं छाये । उपाये चि खुंटतां ॥2॥ तुका म्हणे अवघे जन । येथें मन असों द्या ॥3॥ 1448 ज्याणें ज्याणें जैसें ध्यावें । तैसें व्हावें कृपाळें ॥1॥ सगुणनिर्गुणांचा ठाव । विटे पाव धरियेले ॥ध्रु.॥ अवघें साकरेचें अंग । नये व्यंग निवडितां ॥2॥ तुका ह्मणे जें जें करी । तें तें हरी भोगिता ॥3॥ 1449 आचरती कर्में । तेथें काळें कर्मधर्में ॥1॥ खेळे गोविळयांसवें । करिती तें त्यांचें साहावें ॥ध्रु.॥ यYामुखें घांस । मंत्रपूजेसी उदास ॥2॥ तुका ह्मणे चोरी । योगियां ही सवें करी ॥3॥ 1450 नामाचे पवाडे बोलती पुराणें । होऊनि कीर्तन तो चि ठेला ॥1॥ आदिनाथा कंठीं आगळा हा मंत्र । आवडीचें स्तोत्र सदा घोकी ॥ध्रु.॥ आगळें हे सार उत्तमा उत्तम । ब्रह्मकर्मा नाम एक तुझें ॥2॥ तिहीं त्रिभुवनीं गमन नारदा । हातीं विणा सदा नाम मुखीं ॥3॥ परििक्षती मृत्यु सातां दिवसांचा । मुH जाला वाचा उच्चारितां ॥4॥ कोिळयाची कीतिऩ वाढली गहन । केलें रामायण रामा आधीं ॥5॥ सगुण निर्गुण तुज ह्मणे वेद । तुका ह्मणे भेद नाहीं नांवा ॥6॥ 1451 भूतदयापरत्वें जया तया परी । संत नमस्कारीं सर्वभावें ॥1॥ शिकल्या बोलाचा धरीसील ताठा । तरी जासी वाटा यमपंथें ॥ध्रु.॥ हिरा परिस मोहरा आणीक पाषाण । नव्हे परी जन संतां तैसी ॥2॥ सरितां वाहाळां गंगे सागरा समान । लेखी तयाहून अधम नाहीं ॥3॥ आणीक अमुप होती तारांगणें । रविशशिमानें लेखूं नये ॥4॥ तुका ह्मणे नाहीं नरमता अंगी । नव्हे तें फिरंगी कठिण लोह ॥5॥ 1452 आणीक कांहीं मज नावडे मात । एक पंढरिनाथ वांचुनिया ॥1॥ त्याची च कथा आवडे कीर्तन । तें मज श्रवणें गोड लागे ॥2॥ तुका ह्मणे संत ह्मणोत भलतें । विठ्ठलापरतें न मनी कांहीं ॥3॥ 1453 ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण ॥1॥ एका अनुसरल्या काज । अवघें जाणें पंढरिराज ॥ध्रु.॥ तर्कवितकाऩसी वाव न लागे सायासीं ॥2॥ तुका ह्मणे भावेंविण । अवघा बोलती तो सीण ॥3॥ 1454 येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥1॥ तो चि ध्यावा एका चित्तें । करूनि रितें किळवर ॥ध्रु.॥ षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥2॥ तुका ह्मणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥3॥ 1455 मुH तो आशंका नाहीं जया अंगीं । बद्ध मोहोसंगीं लज्जा चिंता ॥1॥ सुख पावे शांती धरूनि एकांत । दुःखी तो लोकांत दंभ करी ॥2॥ तुका ह्मणे लागे थोडा च विचार । परी हे प्रकार नागविती ॥3॥ 1456 कानीं धरी बोल बहुतांचीं मतें । चाट त्यापरतें आणीक नाहीं ॥1॥ पावेल गौरव वोढाळाचे परी । दंड पाठीवरी यमदूतां ॥ध्रु.॥ शब्दYाानी एक आपुल्याला मतें । सांगती वेदांत भिन्नभावें ॥2॥ तुका ह्मणे एक भाव न धरिती । पडिली हे माती त्यांचे तोंडीं ॥3॥ 1457 देवा ऐकें हे विनंती । मज नको रे हे मुिH । तया इच्छा गति । हें चि सुख आगळें ॥1॥ या वैष्णवांचे घरीं । प्रेमसुख इच्छा करी । रििद्धसिद्धी द्वारीं । कर जोडूनि उभ्या ॥ध्रु.॥ नको वैकुंठींचा वास । असे तया सुखा नास । अद्भुत हा रस । कथाकाळीं नामाचा ॥2॥ तुझ्या नामाचा महिमा । तुज न कळे रे मेघशामा । तुका ह्मणे आह्मां । जन्म गोड यासाटीं ॥3॥ 1458 न पूजीं आणिकां देवां न करीं त्यांची सेवा । न मनीं या केशवाविण दुजें ॥1॥ काय उणें जालें मज तयापायीं । तें मी मागों काइऩ कवणासी ॥ध्रु.॥ आणिकाची कीर्ती नाइकें न बोलें । चाड या विठ्ठलेंविण नाहीं ॥2॥ न पाहें लोचनीं श्रीमुखावांचूनि । पंढरी सांडूनि न वजें कोठें ॥3॥ न करीं कांहीं आस मुHीचे सायास । न भें संसारास येतां जातां ॥4॥ तुका म्हणे कांहीं व्हावें ऐसें जीवा । नाहीं या केशवाविण दुजें ॥5॥ 1459 नव्हे खळवादी मता च पुरता । सत्याची हे सत्ता उपदेश ॥1॥ साक्षत्वेंसी मना आणावीं उत्तरें । परिपाकीं खरें खोटें कळे ॥ध्रु.॥ नव्हे एकदेशी शब्द हा उखता । ब्रह्मांडापुरता घेइऩल त्यासी ॥2॥ तुका विनवणी करी जाणतियां । बहुमतें वांयां श्रमों नये ॥3॥ 1460 या चि नांवें दोष । राहे अंतरीं कििल्मष ॥1॥ मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु.॥ बिजाऐसीं फळें । उत्तम कां अमंगळें ॥2॥ तुका ह्मणे चित्त । शुद्ध करावें हे नित ॥3॥ 1461 कुशळ वHा नव्हे जाणीव श्रोता । राहे भाव चित्ता धरूनियां ॥1॥ धन्य तो जगीं धन्य तो जगीं । ब्रह्म तया अंगीं वसतसे ॥ध्रु.॥ न धोवी तोंड न करी अंघोळी । जपे सदाकाळीं रामराम ॥2॥ जप तप ध्यान नेणे याग युHी । कृपाळु जो भूतीं दयावंत ॥3॥ तुका ह्मणे होय जाणोनि नेणता । आवडे अनंता जीवाहूनि ॥4॥ 1462 काळाचिया सत्ता ते नाहीं घटिका । पंढरीनायका आठवितां ॥1॥ सदाकाळ गणना करी आयुष्याची । कथेचे वेळेची आYाा नाहीं ॥ध्रु.॥ याकारणें माझ्या विठोबाची कीतिऩ । आहे हे त्रिजगतीं थोर वाट ॥2॥ तुका ह्मणे जन्मा आलियाचें फळ । स्मरावा गोपाळ तें चि खरें ॥3॥ 1463 घरोघरीं बहु जाले कवि । नेणे प्रसादाची चवी ॥1॥ लंडा भूषणांची चाड । पुढें न विचारी नाड ॥ध्रु.॥ काढावें आइतें। तें चि जोडावें स्वहितें ॥2॥ तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥3॥ 1464 नये पाहों मुख मात्रागमन्याचें । तैसें अभHाचें गुरुपुत्रा ॥1॥ ह्मणऊनि बरें धरितां एकांत । तेणें नव्हे घात भजनासी ॥ध्रु.॥ नये होऊं कदा निंदकाची भेटी । जया द्वैत पोटीं चांडाळाच्या ॥2॥ तुका ह्मणे नका बोलों त्यासी गोष्टी । जयाचिये दृष्टी पाप वाढे ॥3॥ 1465 कथा करोनिया द्रव्य घेती देती । तयां अधोगति नरकवास ॥1॥ रवरव कुंभपाक भोगिती यातना । नये नारायणा करुणा त्यांची ॥ध्रु.॥ असिखड्गधारा छेदिती सर्वांग । तप्तभूमी अंग लोळविती ॥2॥ तुका ह्मणे तया नरक न चुकती । सांपडले हातीं यमाचिया ॥3॥ 1466 नाइकावे कानीं तयाचे ते बोल । भHीविण फोल Yाान सांगे ॥1॥ वाखाणी अद्वैत भिHभावेंविण । दुःख पावे सीण श्रोता वHा ॥ध्रु.॥ अहं ब्रह्म ह्मणोनि पािळत पिंडा । नो बोलावें भांडा तया सवें ॥2॥ वेदबाहए लंड बोले जो पाषांड । त्याचें काळें तोंड संतांमध्ये ॥3॥ तुका ह्मणे खंडी देवभHपण । वरिष्ठ त्याहूनि श्वपच तो ॥4॥ 1467 वेदविहित तुह्मी आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥1॥ चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥ प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥2॥ आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अिग्न एक ॥3॥ तुका ह्मणे मन उन्मन जों होय । तोंवरि हे सोय विधि पाळीं ॥4॥ 1468 तीर्थांचे मूळ व्रतांचें फळ । ब्रह्म तें केवळ पंढरिये ॥1॥ तें आह्मीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोिळयांचीं ॥ध्रु.॥ जीवांचें जीवन सुखाचें सेजार । उभें कटीं कर ठेवूनियां ॥2॥ जनाचा जनिता कृपेचा सागर । दीनां लोभापार दुष्टां काळ ॥3॥ सुरवरां चिंतनीं मुनिवरां ध्यानीं । आकार निर्गुणीं तें चि असे ॥4॥ तुका ह्मणे नाहीं श्रुती आतुडलें । आह्मां सांपडलें गीती गातां ॥5॥ 1469 माझे मनोरथ पावले सिद्धी । तइप पायीं बुिद्ध िस्थरावली ॥1॥ समाधान जीव राहिला निश्चळ । गेली हळहळ स्मरण हें ॥ध्रु.॥ त्रिविध तापाचें जालेंसे दहन । सुखावलें मन प्रेमसुखें ॥2॥ महालाभ वाचे वसे पांडुरंग । अंगोअंगीं संग अखंडित ॥3॥ जीवनाचा जाला ओलावा अंतरीं । विश्व विश्वंभरीं सामावलें ॥4॥ तुका ह्मणे माप भरी आलें सिगे । धारबोळ गंगे पूर वाहे ॥5॥ 1470 कृपेचें उत्तर देवाचा प्रसाद । आनंदीं आनंद वाढवावा ॥1॥ बहुतांच्या भाग्यें लागलें जाहाज । येथें आतां काज लवलाहें ॥ध्रु.॥ अलभ्य तें आलें दारावरी फुका । येथें आता चुका न पाहिजे ॥2॥ तुका ह्मणे जिव्हाश्रवणाच्या द्वारें । माप भरा वरें सिगेवरि ॥3॥ 1471 पापपुण्यसुखदुःखाचीं मंडळें । एक एकाबळें वाव घेती ॥1॥ कवतुक डोळां पाहिलें सकळ । नाचवितो काळ जीवांसी तो ॥ध्रु.॥ स्वर्गाचिया भोगें सरतां नरक । मागें पुढें एक एक दोन्ही ॥2॥ तुका ह्मणे भय उपजलें मना । घेइप नारायणा कडिये मज ॥3॥ 1472 वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥1॥ केला आतां अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु.॥ संसाराचा नाहीं पांग । देव सांग सकळ ॥2॥ तुका ह्मणे कीर्त वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥3॥ 1473 कथा करोनियां मोल ज्यापें घेती । ते ही दोघे जाती नरकामध्यें ॥1॥ ब्रह्म पूर्ण करा ब्रह्म पूर्ण करा । अखंड स्मरा रामराम ॥ध्रु.॥ मधुरवाणीच्या नका पडों भरी । जाल यमपुरी भोगावया ॥2॥ तुका ह्मणे करीं ब्रह्मांड ठेंगणें । हात पसरी जिणें धिग त्याचें ॥3॥ 1474 गोड नांवें क्षीर । परी साकरेचा धीर ॥1॥ तैसें जाणा ब्रह्मYाान । बापुडें तें भHीविण ॥ध्रु.॥ रुची नेदी अन्न । ज्यांत नसतां लवण ॥2॥ अंधऑयाचे श्रम । शिकविल्याचें चि नाम ॥3॥ तुका ह्मणे तारा । नाव तंबु†याच्या सारा ॥4॥ 1475 नम्र जाला भूतां । तेणें कोंडिलें अनंता ॥1॥ हें चि शूरत्वाचे अंग । हरी आणिला श्रीरंग ॥ध्रु.॥ अवघा जाला पण । लवण सकळां कारण ॥2॥ तुका ह्मणे पाणी । पाताळ तें परी खणी ॥3॥ 1476 आपुल्या महिमानें । धातु परिसें केलें सोनें ॥1॥ तैसें न मनीं माझे आतां । गुणदोष पंढरिनाथा ॥ध्रु.॥ गांवाखालील वाहाळ । गंगा न मनी अमंगळ ॥2॥ तुका ह्मणे माती । केली कस्तुरीनें सरती ॥3॥ 1477 आशाबद्ध वHा । भय श्रोतयाच्या चित्ता ॥1॥ गातो तें चि नाहीं ठावें । तोंड वासी कांहीं द्यावें ॥ध्रु.॥ जालें लोभाचें मांजर । भीक मागे दारोदार ॥2॥ तुका ह्मणे गोणी । माप आणि रितीं दोन्ही ॥3॥ 1478 तक्र शिष्या मान । दुग्धा ह्मणे नारायण ॥1॥ ऐशीं Yाानाचीं डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥ उपदेश तो जगा । आपण सोंवळा इतका मांगा ॥2॥ रसनाशिश्नाचे अंकित । तुका ह्मणे वरदळ िस्पत ॥3॥ 1479 ब्रह्मचारी धर्म घोकावें अक्षर । आश्रमीं विचार षटकर्में ॥1॥ वानप्रस्थ तरी संयोगीं वियोग । संन्यास तो त्याग संकल्पाचा ॥ध्रु.॥ परमहंस तरी जाणे सहज वर्म । तेथें याती धर्म कुळ नाहीं ॥2॥ बोले वर्म जो चाले याविरहित । तो जाणा पतित श्रुति बोले ॥3॥ तुका ह्मणे कांहीं नाहीं नेमाविण । मोकळा तो सीण दुःख पावे ॥4॥ 1480 आह्मी क्षेत्रींचे संन्यासी । देहभरित हृषीकेशी । नाहीं केली ऐशी । आशाकामबोहरी ॥1॥ आलें अयाचित अंगा । सहज तें आह्मां भागा । दाता पांडुरंगा । ऐसा करितां नििंश्चती ॥ध्रु.॥ दंड धरिला दंडायमान । मुळीं मुंडिलें मुंडण । बंदी बंद कौपीन । बहिरवास औठडें ॥2॥ काळें साधियेला काळ । मन करूनि निश्चळ । लौकिकीं विटाळ । धरूनि असों ऐकांत ॥3॥ कार्यकारणाची चाली । वाचावाचत्वें नेमिली । एका नेमें चाली । स्वरूपीं च राहाणें ॥4॥ नव्हे वेषधारी । तुका आहाच वरवरी । आहे तैसीं बरीं। खंडें निवडितों वेदांची ॥5॥ 1481 निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ॥1॥ कोठें ही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांटवावा ॥ध्रु.॥ नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंिद्रयें दमी ॥2॥ तुका ह्मणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ॥3॥ 1482 जैसीं तैसीं तरी । शरणागतें तुझीं हरी ॥1॥ आतां न पाहिजे केलें । ब्रीद लटिकें आपुलें ॥ध्रु.॥ शुद्ध नाहीं चित्त । परी ह्मणवितों भH ॥2॥ मज कोण पुसे रंका । नाम सांगे तुझें तुका ॥3॥ 1483 नाशवंत देह नासेल हा जाणा । कां रे उच्चाराना वाचे नाम ॥1॥ नामें चि तारिले कोटएान हे कोटी । नामें हे वैकुंठी बैसविले ॥ध्रु.॥ नामापरतें सार नाहीं त्रिभुवनीं । तें कां तुह्मी मनीं आठवाना ॥2॥ तुका ह्मणे नाम वेदांसी आगळें । तें दिलें गोपाळें फुकासाटीं ॥3॥ 1484 आळवितां बाळें । मातेतें सुख आगळें ॥1॥ द्यावें आवडी भातुकें । पाहे निवे कवतुकें ॥ध्रु.॥ लेववूनि अळंकार । दृष्टी करावी सादर ॥2॥ आपुलिये पदीं । बैसवूनि कोडें वंदी ॥3॥ नेदी लागों दिठी । उचलोनि लावी कंठीं ॥4॥ तुका ह्मणे लाभा । वारी घ्या वो पद्मनाभा ॥5॥ 1485 तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरिगुण वारूं नये ॥1॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रह्महत्या ॥ध्रु.॥ आपुलिया पापें न सुटे सायासें । कोणा काळें ऐसें निस्तरेल ॥2॥ व्हावें साहए तया न घलावें भय । फुकासाटीं पाहे लाभ घात ॥3॥ तुका ह्मणे हित माना या वचना ॥सुख दुःख जाणा साधे फुका ॥4॥ 1486 देवासाटीं जाणा तयासी च आटी । असेल ज्या गांठीं पुण्यराशी ॥1॥ निर्बळा पाठवी बळें वाराणसी । मेला आला त्यासी अर्ध पुण्य ॥ध्रु.॥ कथें निद्राभंग करावा भोजनीं । तया सुखा धणी पार नाहीं ॥2॥ यागीं रीण घ्यावें द्यावें सुख लाहीं । बुडतां चिंता नाहीं उभयतां ॥3॥ तुका ह्मणे वर्म जाणोनि करावें । एक न घलावें एकावरी ॥4॥ 1487 अग्नीमाजी पडे धातु । लीन होउनि राहे अतु । होय शुद्ध न पवे घातु । पटतंतुप्रमाण ॥1॥ बाहएरंगाचें कारण । मिथ्या अवघें चि भाषण । गर्व ताठा हें अYाान । मरण सवें वाहातसे ॥ध्रु.॥ पुरें मातलिया नदी । लव्हा नांदे जीवनसंधी । वृक्ष उन्मळोनि भेदी । परि तो कधीं भंगेना ॥2॥ हस्ती परदळ तें भंगी । तया पायीं न मरे मुंगी । कोण जाय संगी । पाणोवाणी तयेच्या ॥3॥ पिटितां घणें वरि सैरा । तया पोटीं राहे हिरा । तैशा काय तगती गारा । तया थोरा होऊनि ॥4॥ लीन दीन हें चि सार । भव उतरावया पार। बुडे माथां भार । तुका ह्मणें वाहोनि ॥5॥ 1488 आह्मी वीर जुंझार । करूं जमदाढे मार । तापटिले भार । मोड जाला दोषांचा ॥1॥ जाला हाहाकार । आले हांकीत जुंझार । शंखचक्रांचे शृंगार । कंठीं हार तुळसीचे ॥ध्रु.॥ रामनामांकित बाण । गोपी लाविला चंदन । झळकती निशाणें । गरुडटके पताका ॥2॥ तुका ह्मणे काळ । जालों जिंकोनि निश्चळ । पावला सकळ। भोग आह्मां आमचा ॥3॥ 1489 आशाबद्ध तो जगाचा दास । पूज्य तो उदास सर्वजना ॥1॥ आहे तें अधीन आपुले हातीं । आणिकां ठेविती काय बोल ॥ध्रु.॥ जाणतिया पाठीं लागला उपाध । नेणता तो सिद्ध भोजनासी ॥2॥ तुका ह्मणे भय बांधलें गांठीं । चोर लागे पाठी दुम तया ॥3॥ 1490 आणिकांसी तारी ऐसा नाहीं कोणी । धड तें नासोनि भलता टाकी ॥1॥ सोनें शुद्ध होतें अविट तें घरीं । नासिलें सोनारीं अळंकारीं ॥ध्रु.॥ ओल शुद्ध काळी काळें जिरें बीज । कैंचें लागे निज हाता तेथें ॥2॥ एक गहू करिती अनेक प्रकार । सांजा दिवसीं क्षीर घुगरिया ॥3॥ तुका ह्मणे विषा रुचि एका हातीं । पाधानी नासिती नवनीत ॥4॥ 1491 वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥1॥ कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येइऩल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥ काय मानुनियां राहिले नििंश्चती । काय जाब देती यमदूतां ॥2॥ कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥3॥ काय हातीं नाहीं करील तयासी ॥ काय जालें यांसी काय जाणों ॥4॥ कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥5॥ काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥6॥ तुका ह्मणे कां हीं भोगितील खाणी ॥ कां त्या चक्रपाणी विसरलीं ॥7॥ 1492 काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥1॥ देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥ काय हें शरीर साच कीं जाणार । सकळ विचार जाणती हा ॥2॥ कां हें कळों नये आपुलें आपणा । बाळत्व तारुण्य वृद्धदशा ॥3॥ कां हें आवडलें िप्रयापुत्रधन । काय कामा कोण कोणा आलें ॥4॥ कां हें जन्म वांयां घातलें उत्तम । कां हे रामराम न ह्मणती ॥5॥ काय भुली यांसी पडली जाणतां । देखती मरतां आणिकांसी ॥6॥ काय करिती हे बांधलिया काळें । तुका ह्मणे बळें वज्रपाशीं ॥7॥ 1493 जुंझार ते एक विष्णुदास जगीं । पापपुण्य अंगीं नातळे त्यां ॥1॥ गोविंद आसनीं गोविंद शयनीं । गोविंद त्यां मनीं बैसलासे ॥ध्रु.॥ ऊर्ध पुंड भाळीं कंठीं शोभे माळी । कांपिजे किळकाळ तया भेणें ॥2॥ तुका ह्मणे शंखचक्रांचे शृंगार । नामामृतसार मुखामाजी ॥3॥ 1494 जेणें नाहीं केलें आपुलें स्वहित । पुढिलांचा घात इच्छीतसे ॥1॥ संचितासी जाय मिळोनियां खोडी । पतनाचे ओंडीवरी हांव ॥ध्रु.॥ बांधलें गांठी तें लागलें भोगावें । ऐसियासी देवें काय कीजे ॥2॥ तुका ह्मणे जया गांवां जाणे जया । पुसोनियां तया वाट चाले ॥3॥ 1495 मानी भHांचे उपकार । रुणीया ह्मणवी निरंतर । केला निर्गुणीं आकार । कीर्त मुखें वणिऩतां ॥1॥ ह्मणोनि जया जे वासना ॥ ते पुरवितो पंढरिराणा । जाला भHांचा आंदणा । ते उपकार फेडावया ॥ध्रु.॥ अंबॠषीकारणें । जन्म घेतले नारायणें । एवडें भHींचे लहणें । दास्य करी हा दासाचें ॥2॥ ह्मणियें करितां शंका न धरी । रक्षपाळ बिळच्या द्वारीं । भHीचा आभारी । रीग न पुरे जावया ॥3॥ अर्जुनाचे रथवारु । ते वागवी सर्वेश्वरु । एवडे भHीचे उपकारु । मागें मागें हिंडतसे ॥4॥ पुंडलिकाचे द्वारीं । सम पाउलीं विटेवरी । न वजे कट करीं । धरूनि तेथें राहिला ॥5॥ भावभHीचा अंकित । नाम साजे दिनानाथ । ह्मणोनि राहिला निवांत । तुका चरण धरोनि ॥6॥ 1496 सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥1॥ त्यांचा आह्मांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥ रििद्धसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥2॥ तुका ह्मणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥3॥ 1497 ठाकलोंसें द्वारीं । उभें याचक भीकारी ॥1॥ मज भीक कांहीं देवा । प्रेमभातुकें पाठवा ॥ध्रु.॥ याचकाचा भार । नये घेऊं येरझार ॥2॥ तुका ह्मणे दान । सेवा घेतल्यावांचून ॥3॥ सदाशिवावर अभंग ॥ 2 ॥ 1498 काय धर्म नीत । तुह्मां शिकवावें हित ॥1॥ अवघें रचियेलें हेळा । लीळा ब्रह्मांड सकळा ॥ध्रु.॥ नाम महादेव । येथें निवडला भाव ॥2॥ तुका ह्मणे वेळे । माझें तुह्मां कां न कळे ॥3॥ 1499 भांडावें तें गोड । पुरे सकळ ही कोड ॥1॥ ऐसा घरींचा या मोळा । ठावा निकटां जवळां ॥ध्रु.॥ हाक देतां दारीं । येती जवळी सामोरीं ॥2॥ तुका ह्मणे शिवें । मागितलें हातीं द्यावें ॥3॥ ॥2॥ 1500 ऐसें कां जालें तें मज ही न कळे । कीर्तनाचे रळेपळे जगीं ॥1॥ कैसें तुह्मां देवा वाटतसे बरें । संतांचीं उत्तरें लाजविलीं ॥ध्रु.॥ भाविकां कंटक करिताती पीडा । हा तंव रोकडा अनुभव ॥2॥ तुका ह्मणे नाम निर्वाणीचा बाण । याचा अभिमान नाहीं तुह्मां ॥3॥ [[वर्ग:गाथा]] 2lwvtvz7affx2gqmq9toyzwzhvo9qp2 तुकाराम गाथा/ १५०१ ते १८०० 0 1538 36902 36877 2026-09-19T19:41:47Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36902 wikitext text/x-wiki 1501 तुह्मी बैसलेती निर्गुणाचे खोळे । आह्मां कां हे डोळे कान दिले ॥1॥ नाइकवे तुझी अपकीिर्त्त देवा । अव्हेरली सेवा न देखवे ॥ध्रु.॥ आपुले पोटीं तों राखियेला वाव । आह्मांसी कां भाव अल्प दिला ॥2॥ तुका ह्मणे दुःखी असें हें कळों द्या । पुढिलिया धंद्या मन नेघे ॥3॥ 1502 सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥1॥ सारा अवघें गाबाळ । डोऑया आडील पडळ ॥ध्रु.॥ शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥2॥ तुका ह्मणे कळे । परि होताती अंधळे ॥3॥ 1503 अवघीं भूतें साम्या आलीं । देखिलीं म्यां कैं होतीं ॥1॥ विश्वास तो खरा मग । पांडुरंगकृपेचा ॥ध्रु.॥ माझी कोणी न धरो शंका ।हो कां लोकां निद्वपद्व ॥2॥ तुका ह्मणे जें जें भेटे । तें तें वाटे मी ऐसें ॥3॥ 1504 सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥1॥ येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥ अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रह्मांडाचा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥3॥ 1505 काय वाणूं आतां न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ थोरींव सांडिली आपुली परिसें । नेणे सिवों कैसें लोखंडासी ॥ध्रु.॥ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूति । देह कष्टविती उपकारें ॥2॥ भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देहीं ॥3॥ तुका ह्मणे सुख पराविया सुखें । अमृत हें मुखें जरवतसे ॥4॥ 1506 जन्मा आलों त्याचें । आजि फळ जालें साचें ॥1॥ तुह्मी सांभािळलों संतीं । भय निवारली खंती ॥ध्रु.॥ कृत्याकृत्य जालों । इच्छा केली ते पावलों ॥2॥ तुका ह्मणे काळ । आतां करूं न शके बळ ॥3॥ 1507 काय पुण्यराशी । गेल्या भेदूनि आकाशीं ॥1॥ तुह्मी जालेति कृपाळ । माझा केला जी सांभाळ ॥ध्रु.॥ काय वोळलें संचित । ऐसें नेणें अगणित ॥2॥ तुका ह्मणे नेणें । काय केलें नारायणें ॥3॥ 1508 असें येथींचिया दिनें । भाग्यहीन सकळां ॥1॥ भांडवल एवढें गांठी । नाम कंठीं धरियेलें ॥ध्रु.॥ आणिक तें दुजें कांहीं । मज नाहीं यावरी ॥2॥ तुका ह्मणे केली कोणें । एवढा नेणें लौकिक ॥3॥ 1509 गायें नाचें वायें टाळी । साधन कळी उत्तम हें ॥1॥ काय जाणों तरले किती । नाव ऐती या बैसा ॥ध्रु.॥ सायासाचें नाहीं काम । घेतां नाम विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे निर्वाणीचें । शस्त्र साचें हें एक ॥3॥ 1510 सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥1॥ बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥ वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥2॥ तुका ह्मणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥3॥ 1511 जैसें दावी तैसा राहे । तरि कां देव दुरी आहे ॥1॥ दुःख पावायाचें मूळ । रहनी ठाव नाहीं ताळ ॥ध्रु.॥ माळामुद्रांवरी। कैंचा सोंगें जोडे हरि ॥2॥ तुका ह्मणे देखें । ऐसे परीचीं बहुतेकें ॥3॥ 1512 अवघा तो शकुन । हृदयीं देवाचे चरण ॥1॥ येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥ध्रु.॥ संग हरिच्या नामाचा। शुचिर्भूत सदा वाचा ॥2॥ तुका ह्मणे हरिच्या दासां । शुभकाळ अवघ्या दिशा ॥3॥ 1513 ब्रह्मरूपाचीं कर्में ब्रह्मरूप । विरहित संकल्प होती जाती ॥1॥ ठेविलिया दिसे रंगाऐसी शिळा । उपाधि निराळा स्फटिक मणि ॥ध्रु.॥ नानाभाषामतें आळविती बाळा । प्रबोध तो मूळा जननीठायीं ॥2॥ तुका ह्मणे माझें नमन जाणतियां । लागतसें पायां वेळोवेळां ॥3॥ 1514 नाहीं सुगंधाची लागती लावणी । लावावी ते मनीं शुद्ध होतां ॥1॥ वा†या हातीं माप चाले सज्जनाचें । कीतिऩ मुख त्याचें नारायण ॥ध्रु.॥ प्रभा आणि रवि काय असे आन । उदयीं तंव जन सकळ साक्षी ॥2॥ तुका ह्मणे बरा सत्याचा सायास । नवनीता नाश नाहीं पुन्हा ॥3॥ 1515 तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥1॥ तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥ अक्षरें आणिती अंगासी जाणीव । इच्छा ते गौरव पूज्य व्हावें ॥2॥ तुका ह्मणे विधिनिषधाचे डोहीं । पडिले त्यां नाहीं देव कधीं ॥3॥ 1516 पटे ढाळूं आह्मी विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥1॥ निर्भर अंतरीं सदा सर्वकाळ । घेतला सकळ भार देवें ॥ध्रु.॥ बिळवंत जेणें रचिलें सकळ । आह्मां त्याचें बळ अंकितांसी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी देखत चि नाहीं । देवाविण कांहीं दुसरें तें ॥3॥ 1517 कथेचा उलंघ तो अधमां अधम । नावडे ज्या नाम ओळखा तो ॥1॥ कासया जीऊन जाला भूमी भार । अनउपकार माते कुंसी ॥ध्रु.॥ निद्रेचा आदर जागरणीं वीट । त्याचे पोटीं कीट कुपथ्याचें ॥2॥ तुका ह्मणे दोन्ही बुडविलीं कुळें । ज्याचें तोंड काळें कथेमाजी ॥3॥ 1518 सांडोनी दों अक्षरां । काय करूं हा पसारा । विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥1॥ ह्मणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं । नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥ सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें । नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥2॥ शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण । काना मात्र वांयांविण । तुका ह्मणे बिंदुलीं ॥3॥ 1519 हरिनामाचें करूनि तारूं । भवसिंधुपार उतरलों ॥1॥ फावलें फावलें आतां । पायीं संतां विनटलों ॥ध्रु.॥ हरिनामाचा शस्त्र घोडा । संसार गाढा छेदिला ॥2॥ हरिनामाचीं धनुष्यकांडें । विन्मुख तोंडें किळकाळ ॥3॥ येणें चि बळें सरते आह्मी । हरिचे नामें लोकीं तिहीं ॥4॥ तुका ह्मणे जालों साचे । श्रीविठ्ठलाचे डिंगर ॥5॥ 1520 नव्हें हें गुरुत्व मेघवृिष्ट वाणी । ऐकावी कानीं संतजनीं ॥1॥ आरुष हा शब्द देवाचा प्रसाद । करविला वाद तैसा केला ॥ध्रु.॥ देहपिंड दान दिला एकसरें । मुिळचें तें खरें टांकसाळ ॥2॥ तुका ह्मणे झरा लागला नवनीत । सेविलिया हित पोट धाय ॥3॥ 1521 घटीं अलिप्त असे रवि । अिग्न काष्ठामाजी जेवी । तैसा नारायण जीवीं । जीवसाक्षीवर्तनें ॥1॥ भोग ज्याचे तया अंगीं । भिन्न प्रारब्ध जगीं । विचित्र ये रंगीं । रंगें रंगला गोसावी ॥ध्रु.॥ देह संकल्पासारिखें । एक एकांसी पारिखें । सुख आणि दुःखें । अंगी कर्में त्रिविध ॥2॥ तुका ह्मणे कोडें । न कळे तयासी सांकडें । त्याचिया निवाडें । उगवे केलें विंदान ॥3॥ 1522 सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥1॥ चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥ नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥2॥ तुका ह्मणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥3॥ 1523 जेथें देखें तेथें उभा । अवघ्या गगनाचा गाभा ॥1॥ डोळां बैसलें बैसलें । ध्यान राहोनि संचलें ॥ध्रु.॥ सरसावलें मन । केले सोज्वळ लोचन ॥2॥ तुका ह्मणे सवें । आतां असिजेत देवें ॥3॥ 1524 तान्हे तान्ह प्याली । भूक भुकेने खादली ॥1॥ जेथें तें च नाहीं जालें । झाडा घेतला विठ्ठलें ॥ध्रु.॥ वास वासनेसी नाहीं । मन पांगुळलें पायीं ॥2॥ शेष उरला तुका । जीवा जीवीं जाला चुका ॥3॥ 1525 पाणिपात्र दिगांबरा । हस्त करा सारिखे ॥1॥ आवश्यक देव मनीं । चिंतनींच सादर ॥ध्रु.॥ भिक्षा कामधेनुऐशी । अवकाशीं शयन ॥2॥ पांघरोनि तुका दिशा ॥ केला वास अलक्षीं ॥3॥ 1526 विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रह्मरस ठसावला ॥1॥ माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥ लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥2॥ तुका ह्मणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊमिऩ एकमय ॥3॥ 1527 कृष्णरामनाम मांडीं पां वोळी । तेणें होइल होळी पापा धुनी ॥1॥ ऐसा मना छंद लावीं रे अभ्यास । जया नाहीं नास ब्रह्मरसा ॥ध्रु.॥ जोडी तरी ऐसी करावी न सरे । पुढें आस नुरे मागुताली ॥2॥ तुका ह्मणे ऐसें धरा कांहीं मनीं । यातायाती खाणीं चुकतील ॥3॥ 1528 परमार्थी तो न ह्मणावा आपुला । सलगी धाकुला हेळूं नये ॥1॥ थोडा चि स्फुलिंग बहुत दावाग्नी । वाढतां इंधनीं वाढविला ॥ध्रु.॥ पितियानें तैसा वंदावा कुमर । जयाचें अंतर देवें वसे ॥2॥ तुका ह्मणे शिरीं वाहावें खापर । माजी असे सार नवनीत ॥3॥ 1529 ज्याचा ऐसा अनुभव । विश्व देव सत्यत्वें ॥1॥ देव तया जवळी असे । पाप नासे दरुषणें ॥ध्रु.॥ कामक्रोधा नाहीं चाली । भूतीं जाली समता ॥2॥ तुका ह्मणे भेदाभेद । गेले वाद खंडोनि ॥3॥ 1530 सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥1॥ न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥ देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥2॥ तुका ह्मणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥3॥ 1531 Yाानियांचे घरीं चोजवितां देव । तेथें अहंभाव पाठी लागे ॥1॥ ह्मणोनियां ऐसे सांडिले उपाय । धरियेले पाय दृढ तुझे ॥ध्रु.॥ वेदपारायण पंडित वाचक । न मिळती एक एकांमधीं ॥2॥ पाहों गेलों भाव कैसी आत्मनिष्ठा । तेथें देखें चेष्टा विपरीत ॥3॥ आपुलिया नाहीं निवाले जे अंगें । योगी करती रागें गुरगुरु ॥4॥ तुका ह्मणे मज कोणांचा पांगिला । नको बा विठ्ठला करूं आतां ॥5॥ 1532 पंढरीची वाट पाहें निरंतर । निडळावरी कर ठेवूनियां ॥1॥ जातियां निरोप पाठवीं माहेरा । कां मज सासुरा सांडियेलें ॥ध्रु.॥ पैल कोण दिसे गरुडाचे वारिकें । विठ्ठलासारिकें चतुर्भुज ॥2॥ तुका ह्मणे धीर नाहीं माझ्या जीवा । भेटसी केधवां पांडुरंगा ॥3॥ 1533 ऐसी जोडी करा राम कंठीं धरा । जेणें चुके फेरा गर्भवास ॥1॥ नासिवंत आटी िप्रयापुत्रधन । बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥ नाव धड करा सहजरा नामांची । जे भवसिंधूची थडी पावे ॥2॥ तुका ह्मणे काळा हाणा तोंडावरी । भाता भरा हरिरामबाणीं ॥3॥ 1534 पाहें मजकडे भरोनियां दृष्टी । बहुत हिंपुष्टी जालों माते ॥1॥ करावेंसे वाटे जीवा स्तनपान । नव्हे हें वचन श्रुंघारिक ॥ध्रु.॥ सत्यासाटीं माझी शब्दविवंचना । जोडिल्या वचनाचें तें नव्हे ॥2॥ तुका ह्मणे माझी कळवऑयाची कींव । भागलासे जीव कर्तव्यानें ॥3॥ 1535 तुज ह्मणतील कृपेचा सागर । तरि कां केला धीर पांडुरंगा ॥1॥ आझुनि कां नये तुज माझी दया । काय देवराया पाहातोसि ॥ध्रु.॥ आळवितों जैसें पाडस कुरंगिणी । पीडिलिया वनीं तानभूक ॥2॥ प्रेमरसपान्हा पाजीं माझे आइऩ । धांवें वो विठाइऩ वोरसोनि ॥3॥ तुका ह्मणे माझें कोण हरी दुःख । तुजविण एक पांडुरंगा ॥4॥ 1536 भिH तों कठिण शुळावरील पोळी । निवडे तो बळी विरळा शूर ॥1॥ जेथें पाहें तेथें देखीचा पर्वत । पायाविण भिंत तांतडीची ॥ध्रु.॥ कामावलें तरि पाका ओज घडे । रुचि आणि जोडे श्लाघ्यता हे ॥2॥ तुका ह्मणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिस जागृतीचा ॥3॥ 1537 पापी ह्मणों तरि आठवितों पाय । दोष बळी काय तयाहूनि ॥1॥ ऐशा विचाराचे घालूनि कोंडणी । काय चक्रपाणी निजलेती ॥ध्रु.॥ एकवेळ जेणें पुत्राच्या उद्देशें ॥ घेतल्याचें कैसें नेलें दुःख ॥2॥ तुका ह्मणे अहो वैकुंठनायका । चिंता कां सेवका तुमचिया ॥3॥ 1538 उगविल्या गुंती । ऐशा मागें नेणों किती ॥1॥ ख्यात केली अजामेळें । होतें निघालें दिवाळें ॥ध्रु.॥ मोकलिला प्रायिश्चतीं । कोणी न धरिती हातीं ॥2॥ तुका ह्मणे मुH वाट । वैकुंठीची घडघडाट ॥3॥ 1539 सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरि बा गोविंदा रामकृष्णा ॥1॥ पुण्य पर्वकाळ तीथॉ ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥ अवघे चि लाभ बैसलिया घरा । येती भाव धरा एके ठायीं ॥2॥ सेऑया मेंढएा गाइऩ सेवा घेती ह्मैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥3॥ तुका ह्मणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥4॥ 1540 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत । जो वदे अच्युत सर्व काळ ॥1॥ तयाच्या चिंतनें तरतील दोषी । जळतील रासी पातकाच्या ॥ध्रु.॥ देव इच्छी रज चरणींची माती । धांवत चालती मागें मागें ॥2॥ काय त्यां उरलें वेगळें आणीक । वैकुंठनायक जयां कंठीं ॥3॥ तुका ह्मणे देवभHांचा संगम । तेथें ओघ नाम त्रिवेणीचा ॥4॥ 1541 पाप ताप दैन्य जाय उठाउठीं । जालिया भेटी हरिदासांची ॥1॥ ऐसें बळ नाहीं आणिकांचे अंगीं । तपें तिथॉ जगीं दानें व्रतें ॥ध्रु.॥ चरणींचे रज वंदी शूळपाणी । नाचती कीर्तनीं त्यांचे माथां ॥2॥ भव तरावया उत्तम हे नाव । भिजों नेंदी पाव हात कांहीं ॥3॥ तुका ह्मणे मन जालें समाधान । देखिले चरण वैष्णवांचे ॥4॥ 1542 येणें बोधें आह्मी असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥1॥ आह्मी भूमीवरी एक दइवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥ तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥2॥ न चळे हा मंत्र न ह्मणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥3॥ तुका ह्मणे माझा विठ्ठल विसांवा । सांटवीन हांवा हृदयांत ॥4॥ 1543 बहुतां जन्मींचें संचित । सबळ होय जरि बहुत । तरि चि होय हरिभH । कृपावंत मानसीं ॥1॥ ह्मणवी ह्मणियारा तयांचा । दास आपुल्या दासांचा । अनुसरले वाचा । काया मनें विठ्ठलीं ॥ध्रु.॥ असे भूतदया मानसीं । अवघा देखे हृषीकेशी । जीवें न विसंबे तयासी । मागें मागें हिंडतसे ॥2॥ तुका ह्मणे निविऩकार । शरणागतां वज्रपंजर । जे जे अनुसरले नर । तयां जन्म चुकलें ॥3॥ 1544 तारूं लागलें बंदरीं । चंद्रभागेचिये तिरीं ॥1॥ लुटा लुटा संतजन । अमुप हें रासी धन ॥ध्रु.॥ जाला हरिनामाचा तारा। सीड लागलें फरारा ॥2॥ तुका जवळी हमाल । भार चालवी विठ्ठल ॥3॥ 1545 आळवीन स्वरें । कैशा मधुरा उत्तरें ॥1॥ यें वो यें वो पांडुरंगे । प्रेमपान्हा मज दें गे ॥ध्रु.॥ पसरूनि चोंची । वचन हें करुणेची ॥2॥ तुका ह्मणे बळी । आह्मी लडिवाळें आळीं ॥3॥ 1546 सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥1॥ रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥ शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥2॥ तुका ह्मणे कान्हा । भूक लागली नयनां ॥3॥ 1547 पतितपावना । दिनानाथा नारायणा ॥1॥ तुझें रूप माझे मनीं । राहो नाम जपो वाणी ॥ध्रु.॥ ब्रह्मांडनायका । भHजनाच्या पाळका ॥2॥ जीवांचिया जीवा । तुका ह्मणे देवदेवा ॥3॥ 1548 करीं हें चि काम । मना जपें राम राम ॥1॥ लागो हा चि छंद । मना गोविंद गोविंद ॥2॥ तुका ह्मणे मना । मज भीक द्यावी दीना ॥3॥ 1549 आपुलिया लाजा । धांवे भHांचिया काजा ॥1॥ नाम धरिलें दिनानाथ । सत्य करावया व्रत ॥ध्रु.॥ आघात निवारी। छाया पीतांबरें करी ॥2॥ उभा कर कटीं । तुका ह्मणे याजसाटीं ॥3॥ 1550 साधावया भिHकाज । नाहीं लाज हा धरीत ॥1॥ ऐसियासी शरण जावें । शHी जीवें न वंची ॥ध्रु.॥ भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥2॥ तुका ह्मणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥3॥ 1551 धेनु चरे वनांतरीं । चित्त बाळकापें घरीं ॥1॥ तैसें करीं वो माझे आइऩ । ठाव देऊनि राखें पायीं ॥ध्रु.॥ न काढितां तळमळी । जिवनाबाहेर मासोळी ॥2॥ तुका ह्मणे कुडी । जीवाप्राणांची आवडी ॥3॥ 1552 हरिजनाची कोणां न घडावी निंदा । साहात गोविंदा नाहीं त्याचें ॥1॥ रूपा येऊनियां धरी अवतार । भHां अभयंकर खळां कष्ट ॥ध्रु.॥ दुर्वास हा छळों आला आंबॠषी । सुदर्शन त्यासी जािळत फिरे ॥2॥ द्रौपदीच्या क्षोभें कौरवांची शांति । होऊनि श्रीपति साहे केलें ॥3॥ न साहे चि बब्रु पांडवां पारिखा । धुडाविला सखा बिळभद्र ॥4॥ तुका ह्मणे अंगीं राखिली दुगपधि । अश्वत्थामा वधी पांडवपुत्रां ॥5॥ 1553 ज्यासी आवडी हरिनामांची । तो चि एक बहु शुचि ॥1॥ जपतो हरिनामें बीज । तो चि वर्णांमाजी द्विज ॥2॥ तुका ह्मणे वर्णा धर्म । अवघें आहे सम ब्रह्म ॥3॥ 1554 विठ्ठल हा चित्तीं । [[गोड]] लागे गातां गीतीं ॥1॥ आह्मां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥ विठ्ठल हे वाणी। अमृत हे संजिवनी ॥2॥ रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥3॥ 1555 विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥1॥ भाग्यवंता छंद मनीं । कोडें कानीं ऐकती ॥ध्रु.॥ विठ्ठल हें दैवत भोळें। चाड काळें न धरावी ॥2॥ तुका ह्मणे भलते याती । विठ्ठल चित्तीं ते शुद्ध ॥3॥ 1556 ह्मणे विठ्ठल ब्रह्म नव्हे । त्याचे बोल नाइकावे ॥1॥ मग तो हो का कोणी एक । आदि करोनि ब्रह्मादिक ॥ध्रु.॥ नाहीं विठ्ठल जया ठावा । तो ही डोळां न पाहावा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं। त्याची भीड मज कांहीं ॥3॥ 1557 एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥1॥ मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥ मरणांची तंव गांठोडी पदरीं । जिणें तो चि वरि माप भरी ॥2॥ तुका ह्मणे धींग वाहाती मारग । अंगा आलें मग हालों नेदी ॥3॥ 1558 संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥1॥ ह्मणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥ भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥2॥ तुका ह्मणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥3॥ 1559 संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥1॥ हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥ ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥2॥ तुका ह्मणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥3॥ 1560 जातीचें तें चढे प्रेम । पक्षी स्मरे राम राम ॥1॥ ते काय गुण लागती येरां । कागा पिंजरा शोभेना ॥ध्रु.॥ शिकविलें तें सुजात सोसी । मग तयासी मोल चढे ॥2॥ तुका ह्मणे वेषधारी ॥ हिजडएा नारी नव्हती ॥3॥ 1561 वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥1॥ नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥ फुगातें काउळें । ह्मणे मी राजहंसा आगळें ॥2॥ गजाहूनि खर । ह्मणे चांगला मी फार ॥3॥ मुलाम्याचें नाणें । तुका ह्मणे नव्हे सोनें ॥4॥ 1562 मुH होता परी बळें जाला बद्ध । घेउनियां छंद माझें माझें ॥1॥ पाप पुण्य अंगीं घेतलें जडून । वर्म नेणे कोण करिता तो ॥2॥ तुका ह्मणे वांयां गेलें वांयां विण । जैसा मृगशीण मृगजळीं ॥3॥ 1563 पंढरीये माझें माहेर साजणी । ओविये कांडणीं गाऊं गीत ॥1॥ राही रखुमाइऩ सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥ध्रु.॥ उद्धव अक्रूर व्यास आंबॠषि । भाइऩ नारदासी गौरवीन ॥2॥ गरुड बंधु लडिवाळ पुंडलीक । यांचें कवतुक वाटे मज ॥3॥ मज बहु गोत संत आणि महंत । नित्य आठवीत ओवियेसी ॥4॥ निवृित्त Yाानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥5॥ नागोजन मित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबिरा सोइऩिरया ॥6॥ परसो भागवता सुरदास सांवता । गाइऩन नेणतां सकळांसी ॥7॥ चोखामेळा संत जिवाचे सोइरे । न पडे विसर यांचा घडी ॥8॥ जीवींच्या जीवना एका जनादऩना । पाटका कान्हया मिराबाइऩ ॥9॥ आणीक हे संत महानुभाव मुनि । सकळां चरणीं जीव माझा ॥10॥ आनंदें ओविया गाइऩन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥11॥ तुका ह्मणे माझा बिळया बापमाय । हरुषें नांदों सये घराचारी ॥12॥ 1564 पोट लागलें पाठीशीं । हिंडवितें देशोदेशीं ॥1॥ पोटाभेणें जिकडे जावें । तिकडे पोट येतें सवें ॥ध्रु.॥ जप तप अनुष्ठान। पोटासाटीं जाले दीन ॥2॥ पोटें सांडियेली चवी । नीचापुढें तें नाचवी ॥3॥ पोट काशियानें भरे । तुका ह्मणे झुरझुरूं मरे ॥4॥ आरत्या ॥ 13 ॥ 1565 जगदेश जगदेश तुज ह्मणती । परि या जनामाजी असशील युिH । पुण्यपापविरहित सकळां अधिपति । दृष्टा परि नळणी अलिप्त गति ॥1॥ जय देव जय देव जय पंढरिनाथा । श्रीपंढरिनाथा । नुरे पाप विठ्ठल ह्मणतां सर्वथा ॥ध्रु.॥ आगम निगम तुज नेणती कोणी । परि तूं भाव भिH जवळी च दोन्ही । नेणतां विधियुH राते पूजेनी । न माये ब्रह्मांडीं संपुष्टशयनीं ॥2॥ असुरां काळ भासे विक्राळ पुढें । पसरी मुखएक चावितो धुडें । भHा शरणागता चाले तो पुढें । दावी वाट जाऊ नेदी वांकडें ॥3॥ एकाएकीं बहु विस्तरला सुखें । खेळे त्याची लीळा तो चि कवतुकें। तेथें नरनारी कवण बाळकें । काय पापपुण्य कवण सुखदुःखें ॥4॥ सकळा वर्मां तूं चि जाणशी एक । बद्ध मोक्ष प्राप्त आणि सुखदुःख। जाणों ह्मणतां तुज टकलीं बहुतेकें । तुका ह्मणे शरण आलों मज राखें ॥5॥ 1566 दैत्यभारें पीडिली पृथुवी बाळा । ह्मणोनि तूज येणें जालें गोपाळा । भिHप्रतिपाळक उत्सव सोहळा । मंगळें तुज गाती आबळ बाळा ॥1॥ जय देव जय देव जय गरुडध्वजा । श्रीगरुडध्वजा। आरती ओवाळूं तुज भHीकाजा ॥ध्रु.॥ गुण रूप नाम नाहीं जयासी। चिंतितां तैसा चि होसी तयांसी । मत्स्य कूर्म वराह नरसिंह जालासी। असुरां काळ मुणि ठाके ध्यानासी ॥2॥ सहजर रूपें नाम सांवळा ना गोरा । श्रुति नेती ह्मणती तुज विश्वंभरा। जीवनां जीवन तूं चि होसी दातारा । न कळे पार ब्रह्मादिकां सुरवरां ॥3॥ संतां महंतां घरीं ह्मणवी ह्मणियारा । शंखचक्रगदाआयुधांचा भारा । सुदर्शन घरटी फिरे अवश्वरा । सकुमार ना स्थूळ होसी गोजिरा ॥4॥ भावेंविण तुझें न घडे पूजन । सकळ ही गंगा जाल्या तुजपासून । उत्पित्त प्रळय तू चि करिसी पाळण । धरूनि राहिला तुका निश्चयीं चरण ॥5॥ 1567 काय तुझा महिमा वणूप मी किती । नामें मात्रे भवपाश तुटती । पाहातां पाउले हे विष्णुमूर्ती । कोटिकुळां सहित जे उद्धरती ॥1॥ जय देव जय देव जय पंढरिराया । श्रीपंढरिराया। करुनियां कुरवंडी । सांडीन काया ॥ध्रु.॥ मंगळआरतीचा थोर महिमा । आणीक द्यावया नाहीं उपमा । श्रीमुखासहित देखे जो कर्मा । पासुन सुटे जैसा रवि नासी तमा ॥2॥ धन्य व्रतकाळ हे एकादशी । जागरण उपवास घडे जयांसी । विष्णूचें पूजन एकाभावेंसी। नित्यमुH पूज्य तिहीं लोकांसी ॥3॥ न वजे वांयां काळ जे तुज ध्याती । असे तुझा वास तयांच्या चित्तीं । धालें सुखें सदा प्रेमें डुल्लती । तीथॉ मिळन वास तयांचा वाहाती ॥4॥ देव भH तूं चि जालासी दोन्ही । वाढावया सुख भिH हे जनीं । जड जीवां उद्धार होय लागोनि । शरण तुका वंदी पाउलें दोन्ही ॥5॥ 1568 कंसरायें गर्भ वधियेले सात । ह्मणोनि गोकुळासी आले अनंत । घ्यावया अवतार जालें हें चि निमित्य । असुर संहारूनि तारावे भH ॥1॥ जय देव जय देव जय विश्वरूपा । श्रीविश्वरूपा । ओवाळीन तुज देहदीपें बापा ॥ध्रु.॥ स्थूळरूप होऊनि धरितसे सानें । जैसा भाव तैसा तयांकारणें । दैत्यांसी भासला सिहीं गजान । काळासी महाकाळ यशोदेसी तान्हें ॥2॥ अनंत वर्णी कोणा न कळे चि पार । सगुण कीं निर्गुण हा ही निर्धार । पांगलीं साइऩ अठरा करितां वेव्हार । तो विळतसे गौिळयांचें खिल्लार ॥3॥ तेहतिस कोटि तिहीं देवांसी श्रेष्ठ । पाउलें पाताळीं नेणती स्वर्ग मुगुट । गििळलीं चौदा भूवनें तरि न भरे चि पोट । तो खाउन धाला गोपाळाचें उिच्छष्ट ॥4॥ महिमा वणूप तरि पांगलिया श्रुति । सिणला शेष चिरल्या जिव्हा करितां स्तुती । भावेंविण कांहीं न चले चि युिH । राखें शरण तुकयाबंधु करी विनंती ॥5॥ 1569 परमानंदा परमपुरुषोत्तमरामा । अच्युता अनंता हरि मेघश्यामा । अविनाशा अलक्षा परता परब्रह्मा । अकळकळा कमळापती न कळे महिमा ॥1॥ जय देव जय देव जया जी श्रीपती । मंगळशुभदायका करीन आरती ॥ध्रु.॥ गोविंदा गोपाळा गोकुळरक्षणा। गिरिधरकर भवसागरतारक दधिमथना । मधुसूदन मुनिजीवन धरणीश्रमहरणा । दीनवत्सळ सकळां मूळ जय जयनिधाना ॥2॥ विश्वंभरा सर्वेश्वर जगदाधारा । चक्रधर करुणाकर पावन गजेंद्रा । सुखसागर गुणआगर मुगुटमणी शूरा । कल्याणकैवल्यमूतिऩ मनोहरा ॥3॥ गरुडासना शेषशयना नरहरी । नारायणा ध्याना सुरहरवरगौरी। नंदा नंदनवंदन त्रिभुवनांभीतरी । अनंतनामीं ठसा अवतारांवरी ॥4॥ सगुणनिर्गुणसाक्ष श्रीमंत संतां । भगवाना भगवंता कालकृदांता। उत्पित्तपाळणपासुन संहारणसत्ता । शरण तुकयाबंधु तारीं रिति बहुतां ॥5॥ 1570 पंढरि पुण्यभूमी भीमा दिक्षणावाहिनी । तीर्थ हें चंद्रभागा महा पातकां धुनी । उतरलें वैकुंठमहासुख मेदिनी ॥1॥ जय देवा पांडुरंगा जय अनाथनाथा । आरती ओंवाळीन तुह्मां लIमीकांता ॥ध्रु.॥ नित्य नवा सोहळा हो महावाद्यां गजर । सन्मुख गरुड पारीं उभा जोडुनि कर । मंडितचतुर्भुजा कटीं मिरवती कर ॥2॥ हरिनाम कीर्तन हो आनंद महाद्वारीं । नाचती प्रेमसुखें नर तेथिंच्या नारी । जीवन्मुH लोक नित्य पाहाती हरी ॥3॥ आषाढी कातिऩकी हो गरुडटकयां भार । गर्जती नाम घोष महावैष्णववीर । पापासी रीग नाहीं असुर कांपती सुर ॥4॥ हें सुख पुंडलिकें कसें आणिलें बापें । निर्गुण साकारले आह्मांलागिं हें सोपें । ह्मणोनि चरण धरोनि तुका राहिला सुखें ॥5॥ 1571 अवतार गोकुळीं हो जन तारावयासी । लावण्यरूपडें हे तेजपुंजाळरासी । उगवतां कोटि बिंबें रवि लोपले शशी । उत्साव सुरवरां मही थोर मानसीं ॥1॥ जय देवा कृष्णनाथा जय रखुमाइऩकांता। आरती ओंवाळीन तुह्मां देवकीसुता । जय देवा कृष्णनाथा ॥ध्रु.॥ वसुदेवदेवकीची बंद फोडुनी शाळ । होउनि विश्वजनिता तया पोटिंचा बाळ । दैत्य हे त्रासियेले समूळ कंसासी काळ । राजया उग्रसेना केला मथुरापाळ ॥2॥ राखतां गोधनें हो इंद्र कोपला वरि । मेघ जो कडाडिला शिळा वर्षतां धारीं । राखिलें गोकुळ हें नखीं धरिला गिरी। निर्भय लोकपाळ अवतरले हरी ॥3॥ कौतुक पाहावया माव ब्रह्म्यानें केली । वत्सें चोरोनियां सत्यलोकासि नेलीं । गोपाळ गाइऩवत्सें दोहीं ठायीं राखीलीं । सुखाचा प्रेमसिंधु अनाथांची माउली ॥4॥ तारिलें भHजना दैत्य निदाऩळूनि । पांडवां साहकारी आडल्यां निर्वाणी । गुण मी काय वणूप मति केवढी वाणी । विनवितो दास तुका ठाव देइप चरणीं ॥5॥ 1572 सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरी रेख । मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरH दंत हिरे कैसे शोभले निके ॥1॥ जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥ उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति ह्मणती तयां न कळे गति । भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न गति ॥2॥ ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती। बोडके नग्न एक निराहार इऩित । साधनें योग नाना तपें दारुण किती। सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥3॥ भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक। कामिनी मनमोहना रूप नाम अनेक । नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥4॥ उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । तkवासि तkवसार मूळ जालासी बीज । खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥5॥ 1573 सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ । झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरवलिं मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥1॥ जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाइऩवरा । आरती करीन काया । ओंवािळन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥ गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म [[मोहरी]] । हृदयीं ब्रह्मपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥2॥ घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाट कस्तुरिचा कास पितांबरीची । कटिसूत्र वरि साजिरें प्रभा वर मोतियांची। संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥3॥ सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं । आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥4॥ वणिऩतां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती । उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूतिऩ । तुकयाबंधु ह्मणे स्तवूं मी काय किती ॥5॥ 1574 महा जी महादेवा महाकाळमदऩना । मांडियेलें उग्रतप महादीप्त दारुणा । परिधान व्याघ्रांबर चिदाभस्मलेपना । स्मशान क्रीडास्थळ तुह्मा जी त्रिनयना ॥1॥ जय देवा हरेश्वरा जय पार्वतीवरा। आरती ओंवािळन कैवल्यदातारा । जय. ॥ध्रु.॥ रुद्र हें नाम तुह्मां उग्र संहारासी । शंकर शिव भोळा उदार सर्वस्वीं । उदक बेलपत्र टाळी वाहिल्या देसी । आपुलें पद दासां ठाव देइप कैलासीं ॥2॥ त्रैलोक्यव्यापका हो जन आणि विजन । विराटस्वरूप हें तुझें साजिरें ध्यान । करितो वेद स्तुती कीर्ती मुखें आपण । जाणतां नेणवे हो तुमचें महिमान ॥3॥ बोलतां नाम महिमा असे आश्चर्य जगीं । उपदेश केल्यानंतरें पापें पळती वेगीं । हरहर वाणी गर्जे प्रेम संचरे अंगीं । राहिलि दृष्टी चरणीं रंग मीनला रंगीं ॥4॥ पुजूनि लिंग उभा तुका जोडोनी हात। करिती विYाापना परिसावी हे मात । अखंड राहूं द्यावें माझें चरणीं चित्त । घातले साष्टांग मागे मस्तकीं हात ॥5॥ 1575 अवतारनामभेद गणा आदि अगाद । जयासि पार नाहीं पुढें खुंटला वाद । एक चि दंत शोभे मुख विक्राळ दोंद । ब्रह्मांडामाजि दावी अनंत हे छंद ॥1॥ जय जया गणपती ओंवािळत आरती । साजि†या सरळ भुजा फरशकमळ शोभती ॥ध्रु.॥ हे मही ठेंगणी हो तुज नृत्यनायका । भोंवरि फेर देतां असुर मदिले एकां । घातले तोडरीं हो भHजनपाळका । सहस्र नाम तुज भुिHमुिHदायका ॥2॥ सुंदर शोभला हो रूपें लोपलीं तेजें । उपमा काय देऊं असे आणिक दुजें । रविशशितारागणें जयामाजी सहजें । उदरी सामावलीं जया ब्रह्मांडबीजें ॥3॥ वणिऩता शेष लीळा तया भागलीं मुखें । पांगुळले वेद चारी कैसे राहिले सुखें । अवतार जन्मला हो लिंगनाभी या मुखें । अमूर्त मूतिऩमंत होय भHीच्या सुखें ॥4॥ विश्व हें रूप तुझें हस्त पाद मुखडें । ऐसा चि भाव देइप तया नाचतां पुढें । धूप दीप पंचारति ओंवािळन निवाडें । राखें या शरणागता तुका खेळतां लाडें ॥5॥ 1576 कनकाच्या परियेळीं उजळूनि आरती । रत्नदीपशोभा कैशा पाजळल्या ज्योती ॥1॥ ओंवाळूं गे माये सबाहए साजिरा । राहिरखुमाइऩसत्यभामेच्या वरा ।ध्रु.॥ मंडितचतुर्भुज दिव्य कानीं कुंडलें। श्रीमुखाची शोभा पाहातां तेज फांकलें ॥2॥ वैजयंती माळ गळां शोभे श्रीमंत । शंखचक्रगदापद्म आयुधें शोभत ॥3॥ सांवळा सकुमार जैसा कदऩळीगाभा । चरणीचीं नेपुरें वांकी गर्जती नभा ॥4॥ ओंवािळतां मन हें उभें ठाकलें ठायीं । समदृिष्ट समाधि तुकया लागली पायीं ॥5॥ 1577 भHीचिया पोटीं बोध कांकडा ज्योती । पंचप्राण जीवें भावें ओंवाळूं आरती ॥1॥ ओंवाळू आरती माझ्या पंढरीनाथा। दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ध्रु.॥ काय महिमा वणूप आतां सांगणें तें किती । कोटि ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥2॥ राही रखुमाइऩ दोही दों बाही । मयूर पिच्छचामरें ढािळति ठायीं ठायीं ॥3॥ तुका ह्मणे दीप घेऊनि उन्मनति शोभा । विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा ॥4॥ ॥13॥ 1578 धन्य दिवस आजि दरुषण संतांचें । नांदे तया घरीं दैवत पंढरीचें ॥1॥ धन्य पुण्य रूप कैसा जालें संसार । देव आणि भH दुजा नाहीं विचार ॥ध्रु.॥ धन्य पूर्व पुण्य वोडवलें निरुतें । संतांचें दर्शन जालें भाग्यें बहुतें ॥2॥ तुका ह्मणे धन्य आह्मां जोडली जोडी । संतांचे चरण आतां जीवें न सोडीं ॥3॥ 1579 गाऊं वाणूं तुज विठो तुझा करूं अनुवाद । जिकडे पाहें तिकडे सर्वमय गोविंद ॥1॥ आनंद रे विठोबा जाला माझे मनीं। देखिले लोचनीं विटेसहित पाउले ॥ध्रु.॥ न करीं तपसाधनें रे मुHीचे सायास । हा चि जन्मोजन्मी गोड भHीचा रस ॥2॥ तुका ह्मणे आह्मां प्रेमा उणें तें काइऩ । पंढरीचा राणा सांटविला हृदयीं ॥3॥ 1580 मागणें तें एक तुजप्रति आहे । देशी तरि पाहें पांडुरंगा ॥1॥ या संतांसी निरवीं हें मज देइप । आणिक दुजें काहीं न मगें तुज ॥2॥ तुका ह्मणे आतां उदार होइप । मज ठेवीं पायीं संतांचिया ॥3॥ स्वामींनीं काया ब्रह्म केली ते अभंग ॥ 24 ॥ 1581 शोधितां चि नये । ह्मणोनि वोळगतों पाये ॥1॥ आतां दिसों नये जना । ऐसें करा नारायणा ॥ध्रु.॥ परतोनि मन । गेलें ठायीं चि मुरोन ॥2॥ विसरला तुका । बोलों चालों जाला मुका ॥3॥ 1582 रज्जुसर्पाकार । भासयेलें जगडंबर ॥1॥ ह्मणोनि आठवती पाय । घेतों आलाय बलाय ॥ध्रु.॥ द्रुश द्रुमाकार लाणी। केलों सर्व सासी धणी ॥2॥ तुकीं तुकला तुका । विश्वीं भरोनि उरला लोकां ॥3॥ 1583 ह्मणवितों दास । परि मी असें उदास ॥1॥ हा चि निश्चय माझा । परि मी निश्चयाहुनि दुजा ॥ध्रु.॥ सरतें कर्तुत्व माझ्यानें । परि मी त्याही हून भिन्न ॥2॥ तुका तुकासी तुकला । तुका तुकाहुनि निराळा ॥1॥ 1584 घोंटवीन लाळ ब्रह्मYाान्या हातीं । मुHां आत्मिस्थती सांडवीन ॥1॥ ब्रह्मभूत होते काया च कीर्तनीं । भाग्य तरी ॠणी देवा ऐसा ॥ध्रु.॥ तीर्थ भ्रमकासी आणीन आळस । कडु स्वर्गवास करिन भोग ॥2॥ सांडवीन तपोनिधा अभिमान । यYा आणि दान लाजवीन ॥3॥ भिHभाग्यप्रेमा साधीन पुरुषार्थ । ब्रह्मींचा जो अर्थ निजठेवा ॥4॥ धन्य ह्मणवीन येहे लोकीं लोकां । भाग्य आह्मीं तुका देखियेला ॥5॥ 1585 संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आह्मी या कीर्तनें शुद्ध जालों ॥1॥ आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥ ब्रह्मपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रह्मरस सेवूं सदा ॥3॥ 1586 तुह्मी सनकादिक संत । ह्मणवितां कृपावंत ॥1॥ एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥ध्रु.॥ भाकूनि करुणा । विनवा वैकुंठींचा राणा ॥2॥ तुका ह्मणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥3॥ 1587 आपुल्या माहेरा जाइऩन मी आतां । निरोप या संतां हातीं आला ॥1॥ सुख दुःख माझें ऐकिलें कानीं । कळवळा मनीं करुणेचा ॥ध्रु.॥ करुनी सिद्ध मूळ साउलें भातुकें । येती दिसें एकें न्यावयासी ॥2॥ त्या चि पंथें माझें लागलेंसे चित्त । वाट पाहें नित्य माहेराची ॥3॥ तुका ह्मणे आतां येतील न्यावया । अंगें आपुलिया मायबाप ॥4॥ 1588 चिन्हें उमटताती अंगीं । शकुना जोगीं उत्तम ॥1॥ आठवला बापमाय । येइल काय मूळ नेणों ॥ध्रु.॥ उत्कंठित जालें मन । ते चि खुण तेथींचि ॥2॥ तुका ह्मणे काम वारीं । आळस घरीं करमेना ॥3॥ 1589 आरोनियां पाहे वाट । कटकट सोसेना ॥1॥ आलियांस पुसें मात । तेथें चित्त लागलें ॥ध्रु.॥ दळीं कांडीं लोकांऐसें । परि मी नसें ते ठायीं ॥2॥ तुका ह्मणे येथें पिसें । तेथें तैसें असेल ॥3॥ 1590 येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥1॥ दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥ भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥2॥ तुका ह्मणे सुख जालें । अंतर धालें त्यागुणें ॥3॥ 1591 पैल आले हरि । शंख चक्र शोभे करीं ॥1॥ गरुड येतो फडत्कारें । ना भी ना भी ह्मणे त्वरे ॥ध्रु.॥ मुगुटकुंडलांच्या दीिप्त । तेजें लोपला गभिस्त ॥2॥ मेघश्यामवर्ण हरि । मूतिऩ डोळस साजिरी ॥3॥ चुतर्भुज वैजयंती । गळां माळ हे रुळती ॥4॥ पीतांबर झळके कैसा । उजळल्या दाही दिशा ॥5॥ तुका जालासे संतुष्ट । घरा आलें वैकुंठपीठ ॥6॥ 1592 शंखचक्रगदापद्म । पैल आला पुरुषोत्तम ॥1॥ ना भी ना भी भHराया । वेगीं पावलों सखया ॥ध्रु.॥ दुरूनि येतां दिसे दृष्टी। धाकें दोष पळती सृष्टी ॥2॥ तुका देखोनि एकला । वैकुंठींहूनि हरि आला ॥3॥ 1593 पैल दिसतील भार । दिंडी पताका अपार ॥1॥ आला पंढरीचा राणा । दिसतील त्याच्या खुणा । सुख वाटे मना । डोळे बाहएा स्फुरती ॥ध्रु.॥ उठिले गजर नामाचे । दळभार वैष्णवांचे ॥2॥ तुका करी रिता ठाव । त्यांसी बैसावया वाव ॥3॥ 1594 चला जाऊं रे सामोरे । पुढें भेटों विठ्ठल धुरे ॥1॥ तुका आनंदला मनीं । कैसा जातो लोटांगणीं । फेडावया धणी । प्रेमसुखाची आजि ॥ध्रु.॥ पुढें आले कृपावंत । मायबाप साधुसंत ॥2॥ आळंगिला बाहीं । ठेविला विठोबाचे पायीं ॥3॥ 1595 पाहुणे घरासी । आजि आले हृषीकेशी ॥1॥ काय करूं उपचार । कोंप मोडकी जर्जर । कण्या दरदर । पाण्यामाजी रांधिल्या ॥ध्रु.॥ घरीं मोडकिया बाजा । वरि वाकळांच्या शेजा ॥2॥ मुखशुिद्ध तुळसी दळ । तुका ह्मणे मी दुर्बळ ॥3॥ 1596 संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥1॥ कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि । तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥ध्रु.॥ नसतां कांहीं संचित । भेटी जाली अवचित ॥2॥ देव मिळोनियां भH । तुका केलासे सनाथ ॥3॥ 1597 अवघियांच्या आलों मुळें । एका वेळे न्यावया ॥1॥ सिद्ध व्हावें सिद्ध व्हावें । आधीं ठावें करितों ॥ध्रु.॥ जोंवरि ते घटिका दुरी । आहे उरी तो काळ ॥2॥ मंगळाचे वेळे उभे । असों शोभे सावध ॥3॥ अवघियांचा योग घडे । तरी जोडे श्लाघ्यता ॥4॥ तुका ह्मणे पाहें वाट । बहु आट करूनि ॥5॥ 1598 सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥1॥ कर्मधर्में तुह्मां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥ वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ नििंश्चती जाली तेथें ॥2॥ आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥3॥ वाढवितां लोभ होइऩल उसीर । अवघींच िस्थर करा ठायीं ॥4॥ धर्म अर्थ काम जाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥5॥ तुका ह्मणे आतां जाली हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥6॥ 1599 बोलिलों तें आतां पाळावें वचन । ऐसें पुण्य कोण माझे गांठी ॥1॥ जातों आतां आYाा घेऊनियां स्वामी । काळक्षेप आह्मी करूं कोठें ॥ध्रु.॥ न घडे यावरि न धरवे धीर । पीडतां राष्टध देखोनि जग ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी दिसे मोकलिलें । काय आतां आलें जीवित्वाचें ॥3॥ 1600 करावें तें काम । उगाच वाढवावा श्रम ॥1॥ अवघें एकमय । राज्य बोलों चालों नये ॥ध्रु.॥ दुजयाची सत्ता । न चलेसी जाली आतां ॥2॥ आतां नाहीं तुका । पुन्हा हारपला लोकां ॥3॥ 1601 आह्मी जातों तुह्मी कृपा असों द्यावी । सकळा सांगावी विनंती माझी ॥1॥ वाडवेळ जाला उभा पांडुरंग । वैकुंठा श्रीरंग बोलावितो ॥2॥ अंतकाळीं विठो आह्मांसी पावला । कुडीसहित जाला गुप्त तुका ॥3॥ 1602 तुका उतरला तुकीं । नवल जालें तिहीं लोकीं ॥1॥ नित्य करितों कीर्तन । हें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुका बैसला विमानीं । संत पाहाती लोचनीं ॥2॥ देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी नेला ॥3॥ 1603 न देखिजे ऐसें केलें । या विठ्ठलें दुःखासी ॥1॥ कृपेचिये सिंव्हासनीं । अधिष्ठानीं बैसविलें ॥ध्रु.॥ वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनीं ॥2॥ तुका ह्मणें अवघें ठायीं । मज पायीं राखिलें ॥3॥ 1604 वाराणसीपयपत असों सुखरूप । सांगावा निरोप संतांसी हा ॥1॥ येथूनियां आह्मां जाणें निजधामा । सवें असे आह्मां गरुड हा ॥2॥ कृपा असों द्यावी मज दीनावरी । जातोंसों माहेरी तुका ह्मणे ॥3॥ ॥24॥ शखे 1571 एकाहत्तरीं विरोधनामसंवत्सरीं फालगुनवद्य द्वितीया सोमवासरीं प्रथमप्रहरीं तुकोबा गुप्त जाले ॥1॥ 1605 जाती पंढरीस । ह्मणे जाइपन तयांस ॥1॥ तया आहे संवसार । ऐसें बोले तो माहार ॥ध्रु.॥ असो नसो भाव । जो हा देखे पंढरिराव ॥2॥ चंद्रभागे न्हाती । तुका ह्मणे भलते याती ॥3॥ 1606 धरियेलीं सोंगें । येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥ तें हें ब्रह्म विटेवरी । उभें चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ अंतर व्यापी बाहे । धांडोिळतां कोठें नोहे ॥2॥ योगयागतपें । ज्याकारणें दानजपें ॥3॥ दिले नेदी जति । भोग सकळ ज्या होती ॥4॥ अवघी लीळा पाहे । तुका ह्मणे दासां साहे ॥5॥ 1607 ज्याचे गर्जतां पवाडे । किळकाळ पायां पडे ॥1॥ तो हा पंढरीचा राणा । पुसा सा चौं अठरा जणां ॥ध्रु.॥ चिंतितां जयासी । भुिHमुिH कामारी दासी ॥2॥ वैकुंठासी जावें । तुका ह्मणे ज्याच्या नांवें ॥3॥ 1608 ज्याचे गर्जतां पवाडे । श्रुतिशास्त्रां मौन्य पडे ॥1॥ तेथें माझी वाचा किती । पुरे करावया स्तुती ॥ध्रु.॥ सिणलें सहजर तोंडें । शेषाफणी ऐसें धेंडें ॥2॥ तुका ह्मणे मही । पत्र सिंधु न पुरे शाही ॥3॥ 1609 देव राखे तया मारील कोण । न मोडे कांटा हिंडतां वन ॥1॥ न जळे न बुडे नव्हे कांहीं । विष तें ही अमृत पाहीं ॥ध्रु.॥ न चुके वाट न पडे फंदीं । नव्हे कधीं कधीं यमबाधा ॥2॥ तुका ह्मणे नारायण । येता गोऑया वारी वाण ॥3॥ 1610 कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया । वेळ कां सखया लावियेला ॥1॥ दिनानाथ ब्रीद सांभाळीं आपुले । नको पाहों केलें पापपुण्य ॥ध्रु.॥ पतितपावन ब्रीदें चराचर । पातकी अपार उद्धरिले ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे द्रौपदीचा धांवा । केला तैसा मला पावें आतां ॥3॥ 1611 कोठें गुंतलासी कोणांच्या धांवया । आली देवराया निद्रा तुज ॥1॥ कोठें गुंतलासी भिHप्रेमसुखें । न सुटेती मुखें गोपिकांचीं ॥ध्रु.॥ काय पडिलें तुज कोणाचें संकट । दुरी पंथ वाट न चालवे ॥2॥ काय माझे तुज गुण दोष दिसती । ह्मणोनि श्रीपती कोपलासी ॥3॥ काय जालें सांग माझिया कपाळा । उरला जीव डोळां तुका ह्मणे ॥4॥ 1612 परस्त्रीतें ह्मणतां माता । चित्त लाजवितें चित्ता ॥1॥ काय बोलोनियां तोंडें । मनामाजी कानकोंडें ॥ध्रु.॥ धर्मधारिष्टगोष्टी सांगे । उष्टएा हाते नुडवी काग ॥2॥ जें जें कर्म वसे अंगीं । तें तें आठवे प्रसंगीं ॥3॥ बोले तैसा चाले । तुका ह्मणे तो अमोल ॥4॥ 1613 असत्य वचन होतां सर्व जोडी । जरी लग्नघडी परउपकार ॥1॥ जाइऩल पतना यासि संदेह नाहीं । साक्ष आहे कांहीं सांगतों ते ॥ध्रु.॥ वदविलें मुखें नारायणें धर्मा । अंगुष्ठ त्या कर्मासाटीं गेला ॥2॥ तुका ह्मणे आतां सांभळा रे पुढें । अंतरिंचे कुडें देइल दुःख ॥3॥ 1614 जळों त्याचें तोंड । ऐसी कां ते व्याली रांड ॥1॥ सदा भोवयासी गांठी । क्रोध धडधडीत पोटीं ॥ध्रु.॥ फोडिली गोंवरी। ऐसी दिसे तोंडावरी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥3॥ 1615 तोंडें खाये फार । पादे बोचा करी मार ॥1॥ एक ऐसे ते शाहाणे । आपुले अधीन तें नेणें ॥ध्रु.॥ कुले घालूनि उघडे। रागें पाहे लोकांकडे ॥2॥ खेळे जुतकर्म । मग बोंबली जुलूम ॥3॥ निजतां आला मोहो । वीतां ह्मणे मेला गोहो ॥4॥ तुका ह्मणे त्यांनीं। मनुष्यपणा केली हानी ॥5॥ 1616 पतिव्रता नेणे आणिकांची स्तुती । सर्वभावें पति ध्यानीं मनीं ॥1॥ तैसें माझें मन एकविध जालें । नावडे विठ्ठलेंविण दुजें ॥ध्रु.॥ सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा । गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥2॥ तुका ह्मणे बाळ मातेपुढें नाचे । बोल आणिकांचे नावडती ॥3॥ 1617 पंडित ह्मणतां थोर सुख । परि तो पाहातां अवघा मूर्ख ॥1॥ काय करावें घोकिलें । वेदपठण वांयां गेलें ॥ध्रु.॥ वेदीं सांगितलें तें न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ॥2॥ तुका देखे जीवीं शिव । हा तेथींचा अनुभव ॥3॥ 1618 पंडित तो चि एक भला । नित्य भजे जो विठ्ठला ॥1॥ अवघें सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे ॥ध्रु.॥ रिता नाहीं कोणी ठाव । सर्वां भूतीं वासुदेव ॥2॥ तुका ह्मणे तो चि दास। त्यां देखिल्या जाती दोष ॥3॥ 1619 ऐका पंडितजन । तुमचे वंदितों चरण ॥1॥ नका करूं नरस्तुति । माझी परिसा हे विनंती ॥ध्रु.॥ अन्न आच्छादन । हें तों प्रारब्धा अधीन ॥2॥ तुका ह्मणे वाणी । सुखें वेचा नारायणीं ॥3॥ 1620 विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥1॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥ विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥2॥ विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥3॥ 1621 काय तुझें वेचे मज भेटी देतां । वचन बोलतां एक दोन ॥1॥ काय तुझें रूप घेतों मी चोरोनि । त्या भेणें लपोनि राहिलासी ॥ध्रु.॥ काय तुझें आह्मां करावें वैकुंठ । भेवों नको भेट आतां मज ॥2॥ तुका ह्मणे तुझी नलगे दसोडी । परि आहे आवडी दर्शनाची ॥3॥ 1622 संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥1॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥ संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥2॥ तुका ह्मणे तो नष्ट। जाणा गाढव तो स्पष्ट ॥3॥ 1623 आलें देवाचिया मना । तेथें कोणाचें चालेना ॥1॥ हरिश्चंद्र ताराराणी । वाहे डोंबा घरीं पाणी ॥ध्रु.॥ पांडवांचा साहाकारी। राज्यावरोनि केले दुरी ॥2॥ तुका ह्मणे उगेचि राहा । होइऩल तें सहज पाहा ॥3॥ 1624 निजल्यानें गातां उभा नारायण । बैसल्या कीर्तन करितां डोले ॥1॥ उभा राहोनियां मुखीं नाम वदे । नाचे नाना छंदें गोविंद हा ॥ध्रु.॥ मारगीं चालतां मुखीं नाम वाणी । उभा चक्रपाणी मागें पुढें ॥2॥ तुका ह्मणे यासी कीर्तनाची गोडी । प्रेमे घाली उडी नामासाटीं ॥3॥ 1625 काम क्रोध आह्मी वाहिले विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥1॥ आतां कोण पाहे मागें परतोनि । गेले हारपोनि देहभाव ॥ध्रु.॥ रििद्धसिद्धी सुखें हाणितल्या लाता । तेथें या प्राकृता कोण मानी ॥2॥ तुका ह्मणे आम्ही विठोबाचे दास । करूनि ठेलों ग्रास ब्रह्मांडाचा ॥3॥ 1626 उठाउठीं अभिमान । जाय ऐसें स्थळ कोण ॥1॥ तें या पंढरीस घडे । खळां पाझर रोकडे ॥ध्रु.॥ अश्रूचिया धारा । कोठें रोमांच शरीरा ॥2॥ तुका ह्मणे काला । कोठें अभेद देखिला ॥3॥ 1627 पंढरी पंढरी । ह्मणतां पापाची बोहोरी ॥1॥ धन्य धन्य जगीं ठाव । होतो नामाचा उत्साव ॥ध्रु.॥ रििद्धसिद्धी लोटांगणीं। प्रेमसुखाचिया खाणी ॥2॥ अधिक अक्षरानें एका । भूवैकुंठ ह्मणे तुका ॥3॥ 1628 भार घालीं देवा । न लगे देश डोइऩ घ्यावा ॥1॥ देह प्रारब्धा अधीन । सोसें अधिक वाढे सीण ॥ध्रु.॥ व्यवसाय निमित्त। फळ देतसे संचित ॥2॥ तुका ह्मणे फिरे । भोंवडीनें दम जिरे ॥3॥ 1629 भोग भोगावरी द्यावा । संचिताचा करुनी ठेवा ॥1॥ शांती धरणें जिवासाटीं । दशा उत्तम गोमटी ॥ध्रु.॥ देह लेखावें असार । सत्य परउपकार ॥2॥ तुका ह्मणे हे मिरासी । बुडी द्यावी ब्रह्मरसी ॥3॥ 1630 येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥1॥ मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥ ऐकोनि मरसी कथा। जंव आहेसि तुं जीता ॥2॥ हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥3॥ पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥4॥ आह्मी विठ्ठलाचे वीर । फोडूं किळकाळाचें शीर ॥5॥ घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्त मुखें नाम ॥6॥ तुका ह्मणे मुHी । नाहीं आस चि ये चित्ती ॥7॥ 1631 आनुहातीं गुंतला नेणे बाहए रंग । वृित्त येतां मग बळ लागे ॥1॥ मदें माते तया नाहीं देहभाव । आपुले आवेव आवरितां ॥ध्रु.॥ आणिकांची वाणी वेद तेणें मुखें । उपचारदुःखें नाठवती ॥2॥ तें सुख बोलतां आश्चर्य या जना । विपरीत मना भासतसे ॥3॥ तुका ह्मणे बाहए रंग तो विठ्ठल । अंतर निवालें ब्रह्मरसें ॥4॥ 1632 ब्रह्मरसगोडी तयांसी फावली । वासना निमाली सकळ ज्यांची ॥1॥ नाहीं त्या विटाळ अखंड सोंवळीं । उपाधीवेगळीं जाणिवेच्या ॥ध्रु.॥ मन हें निश्चळ जालें एके ठायीं । तयां उणें काइऩ निजसुखा ॥2॥ तीं चि पुण्यवंतें परउपकारी । प्रबोधी त्या नारीनरलोकां ॥3॥ तुका ह्मणे त्यांचे पायीं पायपोस । होऊनियां वास करिन तेथें ॥ 4॥ 1633 जैसें तैसें राहे देवाचें हें देणें । यत्न करितां तेणें काय नव्हे ॥1॥ दासां कृपासिंधु नुपेक्षी सर्वथा । अंतरींची व्यथा कळे त्यासी ॥ध्रु.॥ मागों नेणे परी माय जाणे वर्म । बाळा नेदी श्रम पावों कांहीं ॥2॥ तुका ह्मणे मज अनुभव अंगें । वचन वाउगें मानेना हें ॥3॥ 1634 आह्मां हरिच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रैलोकीं ॥1॥ देव उभा मागें-पुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥ जैसा केला तैसा होय। धांवे सोय धरोनि ॥2॥ तुका ह्मणे असों सुखें । गाऊं मुखें विठोबा ॥3॥ 1635 परद्रव्यपरनारीचा अभिळास । तेथूनि हारास सर्वभाग्या ॥1॥ घटिका दिवस मास वरुषें लागेतीन । बांधलें पतन गांठोडीस ॥ध्रु.॥ पुढें घात त्याचा रोकडा शकुन । पुढें करी गुण निश्चयेंसी ॥2॥ तुका ह्मणे एकां तडतांथवड । काळ लागे नाड परी खरा ॥3॥ 1636 समर्थाचें केलें । कोणां जाइऩल मोडिलें ॥1॥ वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥ ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥2॥ ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥3॥ तुका ह्मणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥4॥ 1637 हे माझी मिराशी । ठाव तुझ्या पायांपाशीं ॥1॥ याचा धरीन अभिमान । करीन आपुलें जतन ॥ध्रु.॥ देऊनियां जीव। बळी साधिला हा ठाव ॥2॥ तुका ह्मणे देवा । जुन्हाट हे माझी सेवा ॥3॥ 1638 नेणे गति काय कवण अधोगति । मानिली नििंश्चती तुझ्या पायीं ॥1॥ कर्म धर्म कोण नेणें हा उपाव । तुझ्या पायीं भाव ठेवियेला ॥ध्रु.॥ नेणें निरसं पाप पुण्य नेणें काय । ह्मणऊनि पाय धरिले तुझे ॥2॥ वेडा मी अविचार न कळे विचार । तुज माझा भार पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे तुज करितां नव्हे काय । माझा तो उपाय कवण तेथें ॥4॥ 1639 तुझा ह्मणऊनि जालों उतराइऩ । त्याचें वर्म काइऩ तें मी नेणें ॥1॥ हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥ देवभHपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥2॥ अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥3॥ तुका ह्मणे बहु नेणता मी फार । ह्मणऊनि विचार जाणविला ॥4॥ 1640 मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥1॥ सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥ पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥2॥ तुका ह्मणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥3॥ 1641 जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥1॥ ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥ सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥2॥ तुका ह्मणे भय । करा जवळी तें नये ॥3॥ 1642 अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥1॥ तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥ नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥2॥ तुका ह्मणे दिला वाव । पायीं लागों दिला भाव ॥3॥ 1643 पवित्र होइऩन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥1॥ आपुरती बुिद्ध पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥ गाइऩन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥2॥ तुका ह्मणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥3॥ 1644 काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥1॥ कोणे तरी काळें होइऩल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥ शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होइल दया ॥2॥ तुका ह्मणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥3॥ 1645 नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥1॥ एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥ कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥2॥ तुका ह्मणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होइऩल ते ॥3॥ 1646 काय करील तें नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥1॥ मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥2॥ तुका ह्मणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥3॥ 1647 संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥1॥ किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥ माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥2॥ तुका ह्मणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥3॥ 1648 दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥1॥ तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥ काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥2॥ तुका ह्मणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥3॥ 1649 सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुिद्ध मग ॥1॥ आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥ नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥2॥ तुका ह्मणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥3॥ वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र धाडिलें - ते अभंग ॥ 4 ॥ 1650 परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥ जीतां भुिH मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥2॥ तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥3॥ 1651 तुह्मी विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥1॥ कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥ काय उणें तुह्मांपाशीं। मी तों अल्पें चि संतोषी ॥2॥ तुका ह्मणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥3॥ 1652 पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥1॥ माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥ केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥2॥ तुका ह्मणे माझें । भार उतरलें ओझें ॥3॥ ॥3॥ 1653 मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥1॥ तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥ नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥2॥ जीवींचें ते जाणा । तुका ह्मणे नारायणा ॥3॥ 1654 जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥1॥ हरूनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥ दावूनियां रूप डोळां। मन चाळा लावियेलें ॥2॥ आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥3॥ बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोइऩ ॥4॥ तुका ह्मणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥5॥ 1655 नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥1॥ गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥ राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥2॥ देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥3॥ जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥4॥ तुका ह्मणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥5॥ 1656 वाट पाहें हरि कां नये आझूनि । निष्ठ‍ कां मनीं धरियेलें ॥1॥ काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥ नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥2॥ नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥3॥ बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवािळलें ॥4॥ तुका ह्मणे देइप एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥5॥ 1657 नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥1॥ ह्मणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥ वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥3॥ 1658 आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रह्मरस ॥1॥ सुखें सेवीन अमृत । ब्रह्मपदींचें नििश्चत ॥ध्रु.॥ तुमचा निज ठेवा । आह्मी पाडियेला ठावा ॥2॥ तुका ह्मणे देवरांया । आतां लपालेती वांयां ॥3॥ 1659 जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥1॥ ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥ चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥2॥ तुका ह्मणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥3॥ 1660 सांपडला हातीं । तरी जाली हे नििंश्चती ॥1॥ नाहीं धांवा घेत मन । इंिद्रयांचें समाधान ॥ध्रु.॥ सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥2॥ तुका ह्मणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥3॥ 1661 मुिHपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥1॥ बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥ भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥2॥ बळ बुिद्ध त्यांची उपकारासाटीं । अमृत तें पोटी सांटवलें ॥3॥ दयावेंत तरी देवा च सारिखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥4॥ तुका ह्मणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥5॥ 1662 सेवीन उिच्छष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥1॥ ऐसें जन्म आतां मज देइप देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥ त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥2॥ तुका ह्मणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥3॥ 1663 क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥1॥ आतां झडझडां चालें । देइप उचलूं पाउलें ॥ध्रु.॥ सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे आइऩ । श्रीरंगे विठाबाइऩ ॥3॥ 1664 जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥1॥ कंठ कंठा मिळों देइप । माझा वोरस तूं घेइप ॥ध्रु.॥ नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥2॥ टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥3॥ हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥4॥ तुका ह्मणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥5॥ 1665 कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥1॥ मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाइऩ काचें ॥ध्रु.॥ जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥2॥ तुका ह्मणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥3॥ 1666 दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥1॥ तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥ रििद्धसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥2॥ उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळइऩ ॥3॥ दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥4॥ तुका ह्मणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥5॥ 1667 काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥1॥ आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥ लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥2॥ भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥3॥ माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥4॥ तुका ह्मणे नारायणा । तुह्मी जाणां बुझावूं ॥5॥ 1668 तरीं आह्मी तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥1॥ आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येइप लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥ पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥2॥ तुका ह्मणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥3॥ 1669 करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥1॥ जाणतसां तुह्मीं रूपाचें लाघव । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥ काय ह्मणऊनि आलेती आकारा । आह्मां उजगरा करावया ॥2॥ तुका ह्मणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥3॥ 1670 धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥1॥ काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥ अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥2॥ रुसलेती तरी होइऩल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥3॥ सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥4॥ तुका ह्मणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥5॥ 1671 निष्ठ‍ा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥1॥ तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाइऩच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥ मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥2॥ पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥3॥ राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥4॥ तुका ह्मणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥5॥ 1672 सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥1॥ सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥ अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥2॥ तुका ह्मणे जतन करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥3॥ 1673 मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥1॥ तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥ वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥2॥ तुका ह्मणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥3॥ 1674 तुज नाहीं शिH । काम घेसी आह्मां हातीं ॥1॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥ लपोनियां आड । आह्मां तुझा कैवाड ॥2॥ तुका ह्मणे तुजसाठी । आह्मां संवसारें तुटी ॥3॥ 1675 तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥1॥ झडलें उरलें किती । आह्मी धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥ कळलासी नष्टा। यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥2॥ तुका ह्मणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥3॥ 1676 भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥1॥ नये खंडों देऊं वाद । आह्मां भांडवलभेद ॥ध्रु.॥ शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥2॥ तुका ह्मणे आळस । तो चि कारणांचा नास ॥3॥ 1677 नव्हों गांढे आळसी । जो तूं आह्मांपुढें जासी ॥1॥ अरे दिलें आह्मां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥ धरोनियां वाट। जालों शिरोमणि थोंट ॥2॥ तुका ह्मणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥3॥ 1678 तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥1॥ जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥ कुश्चीळ इंिद्रयें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥2॥ पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥3॥ पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥4॥ तुका ह्मणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥5॥ 1679 ऐसें सत्य माझें येइऩल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥1॥ वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होइल भाव ॥ध्रु.॥ तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥2॥ तुका ह्मणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥3॥ 1680 आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥1॥ आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥ आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥2॥ तुका ह्मणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होइऩल तें ॥3॥ 1681 सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥1॥ हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥ चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥2॥ तुका ह्मणे कोणा। बोल ठेवितो शाहाणा ॥3॥ 1682 आह्मी न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥1॥ अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥ मज मुHी सवें चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥2॥ तुका ह्मणे घोटीं। विष अमृत तुजसाटीं ॥3॥ 1683 मज नाहीं तुझ्या Yाानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥1॥ नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥ भHी नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाइऩ भार तुज ॥2॥ तुका ह्मणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥3॥ 1684 काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥1॥ कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥ बोबडा उत्तरीं ह्मणें हरिहरि । आणीक भीकारी नेणें दुजें॥2॥ तुका ह्मणे तुह्मी विठ्ठलाचे दास । करितों मी आस उिच्छष्टाची॥3॥ 1685 जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भूषणु नारायण ॥1॥ सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥ गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥2॥ भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥3॥ तुका ह्मणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥4॥ 1686 आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥1॥ माय रखुमाइऩ पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥ बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥2॥ दृष्ट नव्हों आह्मी अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥3॥ संवसार आह्मां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥4॥ तुका ह्मणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥5॥ 1687 केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥1॥ देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाहए रंग ॥ध्रु.॥ त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥2॥ तुका ह्मणे आपआपण्यां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुह्मां ॥3॥ 1688 हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥1॥ आवडी विठ्ठल गाइऩजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥ आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥2॥ तुका ह्मणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥3॥ 1689 हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥1॥ ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥ ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाहए कोमळ ॥2॥ तुका ह्मणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥3॥ 1690 हरिची हरिकथा नावडे जया । अधम ह्मणतां तया वेळ लागे । मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥1॥ कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं। उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं ॥ध्रु.॥ ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी। देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥2॥ राम ह्मणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी । जन्मोजन्मींचा होइऩल नरकीं । तुका ह्मणे चुकी जरी यासी ॥3॥ 1691 उपेिक्षला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आइऩिकली ॥1॥ आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥ माझ्या दोषासाटीं होइल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥2॥ तुका ह्मणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥3॥ 1692 आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥1॥ कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥ हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥2॥ तुका ह्मणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूतिऩ ॥3॥ 1693 धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥1॥ धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥ ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥2॥ तुका ह्मणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥3॥ 1694 आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥1॥ न पुरे हा जन्म हें सुख सांटितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥ मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥2॥ तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥3॥ 1695 नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । ह्मणऊनि मन िस्थरावलें ॥1॥ धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥ शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता ॥2॥ तुका ह्मणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥3॥ 1696 मायबापापुढें लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥1॥ कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥ नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कविळते ॥2॥ तुका ह्मणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥3॥ 1697 आठवों नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥1॥ मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥ न लगे वोळावीं इंिद्रयें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥2॥ तुका ह्मणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥3॥ 1698 उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊनि तें ॥1॥ न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥ नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥2॥ तुका ह्मणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाहए रूप ॥3॥ 1699 आह्मां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥1॥ लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥ आह्मां आणिकांची चाड चि नाहीं । सर्व सुखें पायीं विठोबाच्या ॥2॥ तुका ह्मणे आह्मी नेघों या मुHी । एकविण चित्तीं दुजें नाहीं ॥3॥ 1700 चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥1॥ डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥ संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥2॥ तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥3॥ जन्म नाहीं रे आणीक । तुका ह्मणे माझी भाक ॥4॥ 1701 पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥1॥ हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेटएां वायें ॥ध्रु.॥ सांडुनियां शुद्धी। निजलासी गेली बुद्धी ॥2॥ चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥3॥ भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥4॥ तुका ह्मणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥5॥ 1702 किती वेळा खादला दगा । अझून कां जागसी ना ॥1॥ लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥ सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥2॥ तुका ह्मणे सांडिती वाट । तळपट करावया ॥3॥ 1703 मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥1॥ आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥ एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥2॥ तुका ह्मणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥3॥ 1704 निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥1॥ असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥ उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥2॥ तुका ह्मणे धाक । तया इह ना परलोक ॥3॥ 1705 शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥1॥ केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥ धीर तो कारण । साहए होतो नारायण ॥2॥ तुका ह्मणे हरि । दासां रिक्षतो निर्धारीं ॥3॥ 1706 हरिच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥1॥ राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥ हरिच्या दासां चिंता। अघटित हे वार्ता ॥2॥ खावे ल्यावें द्यावें । तुका ह्मणे पुरवावें ॥3॥ 1707 दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥1॥ जेथें वसती हरिदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥ फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥2॥ तुका ह्मणे घरीं । होय ह्मणियारा कामारी ॥3॥ 1708 आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥1॥ मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥ नाहीं निपराद । कोणां आह्मांमध्यें भेद ॥2॥ तुका ह्मणे मान । अवघें आमचें हें धन ॥3॥ 1709 काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥1॥ नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥ काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥2॥ तुका ह्मणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥3॥ 1710 आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥1॥ गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥ झणी दृिष्ट लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥2॥ तुका ह्मणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥3॥ 1711 मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आह्मां जन्म घेणें युगायुगीं ॥1॥ विटे ऐसें सुख नव्हे भिHरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥ देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥2॥ तुका ह्मणे चित्त निवांत राहिलें । ध्याइप तीं पाउलें विटेवरि ॥3॥ 1712 नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥1॥ ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥ प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥2॥ तुका ह्मणे हिता । कां रे नागवसी थीता ॥3॥ 1713 अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न ह्मणावी ॥1॥ उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥ शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥2॥ तुका ह्मणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाइऩिवण नाहीं ॥3॥ 1714 शूरां साजती हतियारें । गांढएां हासतील पोरें ॥1॥ काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥ पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥2॥ दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥3॥ मान बुिद्धवंतां । थोर न मनिती पिता ॥4॥ तुका ह्मणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥5॥ 1715 काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥1॥ हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥ श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥2॥ तुका ह्मणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥3॥ 1716 वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥1॥ एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥ विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥2॥ कािळमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥3॥ उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥4॥ तुका ह्मणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥5॥ 1717 असो खळ ऐसे फार । आह्मां त्यांचे उपकार ॥1॥ करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥ फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥2॥ पार उतरुन ह्मणे तुका । आह्मां आपण जाती नरका ॥3॥ 1718 संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥1॥ माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥ केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥2॥ तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥3॥ तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥4॥ तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥5॥ लागती पादुका । ते मी तळील मृित्तका ॥6॥ तुका ह्मणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥7॥ 1719 इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥1॥ यांचा विश्वास तो काइऩ । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥ सुगंध अभ्यंगें पािळतां । केश फिरले जाणतां ॥2॥ पिंड पािळतां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥3॥ करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥4॥ अल्प जीवन करीं । तुका ह्मणे साधीं हरी ॥5॥ 1720 यYानिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥1॥ नव्हे ते भिH परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥ आशा धरूनि फळाची । तीथाअ व्रतीं मुिH कैंचि ॥2॥ तुका ह्मणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥3॥ 1721 संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां । न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥1॥ ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥ पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा । अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥2॥ अंतकाळीं गणिका पिक्षयाच्या छंदें । राम राम उच्चारिलें । तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥3॥ अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे । तुका ह्मणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥4॥ 1722 दुष्टाचें चित्त न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला। पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥1॥ जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा। जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥ पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो। कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥2॥ तुका ह्मणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं । ह्मणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥3॥ 1723 कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं आतां ॥1॥ उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥ गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥2॥ फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥3॥ वाहूं दिक्षणा जरी धातु नारायण । ब्रह्म तें चि अन्न दुजें काइऩ ॥4॥ गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥5॥ तुका ह्मणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥6॥ 1724 गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥1॥ रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥ विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥2॥ वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥3॥ तीर्थाटण नाहीं केले उपकार । पािळलें शरीर पुष्ट लोभें ॥4॥ तुका ह्मणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥5॥ 1725 तुझें ह्मणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥1॥ परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥ समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥2॥ लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥3॥ मृित्तका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥4॥ तुका ह्मणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥5॥ 1726 जाऊनियां तीर्था काय तुवां केलें । चर्म प्रक्षािळलें वरीं वरीं ॥1॥ अंतरींचें शुद्ध कासयानें जालें । भूषण तों केलें आपणया ॥ध्रु.॥ इंद्रावण फळ घोिळलें साकरा । भीतरील थारा मोडे चि ना ॥2॥ तुका ह्मणे नाहीं शांति क्षमा दया । तोंवरी कासया काुंफ्दां तुह्मी ॥3॥ 1727 बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥1॥ येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥2॥ तुका ह्मणे ऐसें देइऩन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥3॥ 1728 धन्य पुंडलिका बहु बरें केलें । निधान आणिलें पंढरिये ॥1॥ न पवीजे केल्या तपांचिया रासी । तें जनलोकांसी दाखविलें ॥ध्रु.॥ सवाौत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव । शास्त्रांनी हा भाव निवडिला ॥2॥ विष्णुपद गया रामधाम काशी । अवघीं पायांपाशीं विठोबाच्या ॥3॥ तुका ह्मणे मोक्ष देखिल्या कळस । तात्काळ या नास अहंकाराचा ॥4॥ 1729 धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥1॥ धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥ धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥2॥ धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥3॥ धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥4॥ तुका ह्मणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥5॥ 1730 मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥1॥ नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥ कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥2॥ वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥3॥ आह्मां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥4॥ तुका ह्मणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥5॥ 1731 मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ िस्थर नाहीं ॥1॥ आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥ धांव घालीं पुढें इंिद्रयांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥2॥ तुका ह्मणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥3॥ 1732 मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥1॥ काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥ एकें सांटवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥2॥ तुका ह्मणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥3॥ 1733 जिचें पीडे बाळ । प्राण तयेचा विकळ ॥1॥ ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥ सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे संत । तुह्मी बहु कृपावंत ॥3॥ 1734 यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥1॥ घ्यावी उिच्छष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥ भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥2॥ तुका ह्मणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥3॥ 1735 लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥1॥ ऐसी कळवऑयाची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥ पोटीं भार वाहे। त्याचें सर्वस्व ही साहे ॥2॥ तुका ह्मणे माझें । तैसे तुह्मां संतां ओझें ॥3॥ 1736 आह्मां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥1॥ जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥ आह्मीं जना भ्यावें। तरि कां न लाजिजे देवें ॥2॥ तुका ह्मणे देश । जाला देवाविण ओस ॥3॥ 1737 तुह्मी पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥1॥ आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥ भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥2॥ तुका ह्मणे भये । आतां स्वप्नीं ही नये ॥3॥ 1738 काळाचे ही काळ । आह्मी विठोबाचे लडिवाळ ॥1॥ करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥ ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥2॥ तुका ह्मणे बाण । हातीं हरिनाम तीक्षण ॥3॥ 1739 जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥1॥ नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥ घरा व्याही पाहुणा आला । ह्मणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥2॥ उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें ह्मणे यांसी । ह्मणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥3॥ पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला ह्मणे पोरां । तुमचा उणा होइऩल वांटा । काळ पिठासी आला ॥4॥ दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । ह्मणे आतां उगवीं मोडी । डोइऩ बोडीं आपुली ॥5॥ तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं। आल्या घर ह्मणे ओस ॥6॥ तुका ह्मणे ऐसे आहेत गा हरी। या ही तारीं जीवांसी । माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती ह्मणोनि ॥7॥ 1740 जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥1॥ तो ही कारणांचा दास । देव ह्मणवितां पावे नास ॥ध्रु.॥ वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥2॥ तुका ह्मणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥3॥ 1741 घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥1॥ आह्मी भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥ उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥2॥ तुका ह्मणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥3॥ 1742 सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥1॥ आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥ मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥2॥ तुका ह्मणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥3॥ 1743 तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥1॥ जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥ दाविल्या सारिखें । मागें नसावें पारिखें ॥2॥ मागें पुढें ॠण । तुका ह्मणे फिटे हीण ॥3॥ 1744 नसावें ओशाळ । मग मानिती सकळ ॥1॥ जाय तेथें पावे मान । चाले बोलिलें वचन ॥ध्रु.॥ राहों नेदी बाकी । दान ज्याचें त्यासी टाकी ॥2॥ होवा वाटे जना । तुका ह्मणे साटीं गुणां ॥3॥ अनघडसिद्धाच्या शब्देंकरून रामेश्वरभटाच्या शरीरीं दाह जाला तो ज्यानें शमला तो अभंग ॥ 1 ॥ 1745 चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥1॥ विष तें अमृत अघातें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥ध्रु.॥ दुःख तें देइऩल सर्व सुख फळ । होतील शीतळ अिग्नज्वाळा ॥2॥ आवडेल जीवां जीवाचे परी । सकळां अंतरीं एक भाव ॥3॥ तुका ह्मणे कृपा केली नारायणें । जाणियेते येणें अनुभवें ॥4॥ 1746 लाज वाटे मज मानिती हे लोक । हें तों नाहीं एक माझे अंगी ॥1॥ मजुनि झिजलों मापाचिया परी । जाळावी हे थोरी लाभाविण ॥ध्रु.॥ कोमळ कंटक तीक्षण अगरीं । पोचट ते वरी अंगकांति ॥2॥ चित्रींचे लेप शृंगारिलें निकें । जीवेंविण फिकें रूप त्याचें ॥3॥ तुका ह्मणे दिसें वांयां गेलों देवा । अनुभव ठावा नाहीं तेणें ॥4॥ 1747 बोलविसी माझें मुख । परी या जना वाटे दुःख ॥1॥ जया जयाची आवडी । तया लागीं तें चरफडी ॥ध्रु.॥ कठीण देतां काढा । जल्पे रोगी मेळवी दाढा ॥2॥ खाऊं नये तें चि मागे । निवारितां रडों लागे ॥3॥ वैद्या भीड काय । अतित्याइऩ जीवें जाय ॥4॥ नये भिडा सांगों आन । पथ्य औषधाकारण ॥5॥ धन माया पुत्र दारा । हे तों आवडी नरका थारा ॥6॥ तुका ह्मणे यांत । आवडे ते करा मात ॥7॥ 1748 पतिव्रते आनंद मनीं । सिंदळ खोंचे व्यभिचारवचनीं ॥1॥ जळो वर्म लागो आगी । शुद्धपण भलें जगीं ॥ध्रु.॥ सुख पुराणीं आचारशीळा । दुःख वाटे अनर्गळा ॥2॥ शूरा उल्हास अंगीं । गांढएा मरण ते प्रसंगीं ॥3॥ शुद्ध सोनें उजळे अगी । हीन काळें धांवे रंगीं ॥4॥ तुका ह्मणे तो चि हिरा । घनघायें निवडे पुरा ॥5॥ 1749 चालिती आड वाटा । आणिकां द्राविती जे नीटा ॥1॥ न मनीं तयांचे उपकार । नाहीं जोडा तो गंव्हार ॥ध्रु.॥ विष सेवूनि वारी मागें । प्राण जातां जेणें संगें ॥2॥ बुडतां हाक मारी । ठाव नाहीं आणिकां वारी ॥3॥ तुका ह्मणे न करीं हिंका । गुण घेऊन अवगुण टाका ॥4॥ 1750 कुळींचे दैवत ज्याचें पंढरीनाथ । होइऩन दासीसुत त्याचे घरीं ॥1॥ शुद्ध यातिकुळवर्णा चाड नाहीं । करीं भलते ठायीं दास तुझा ॥ध्रु.॥ पंढरीस कोणी जाती वारेकरी । होइऩन त्यांचे घरीं पशुयाति ॥2॥ विठ्ठलचिंतन दिवसरात्रीं ध्यान । होइऩन पायतन त्याचे पायीं ॥3॥ तुळसीवृंदावन जयाचे अंगणीं । होइन केरसुणी त्याचे घरीं ॥4॥ तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज ॥5॥ 1751 अवघिया चाडा कुंटित करूनि । लावीं आपुली च गोडी । आशा मनसा तृष्णा कल्पना । करूनियां देशधडी । मीतूंपणापासाव गुंतलों । मिथ्या संकल्प तो माझा तोडीं । तुझिये चरणीं माझे दोन्ही पक्ष । अवघी करुनि दाखवीं पिंडी रे रे ॥1॥ माझें साच काय केलें मृगजळ । वर्णा याती कुळ अभिमान । कुमारी भातुकें खेळती कवतुकें । काय त्यांचें साचपण ॥ध्रु.॥ वेगळाल्या भावें चित्ता तडातोडी । केलों देशधडी मायाजाळें । गोत वित्त माय बाप बहिणी सुत । बंधुवर्ग माझीं बाळें । एका एक न धरी संबंध पुरलिया । पातलिया जवळी काळें । जाणोनियां त्याग सर्वस्वें केला। सांभाळीं आपुलें जाळें ॥2॥ एकां जवळी धरी आणिकां अंतरीं । तीं काय सोयरीं नव्हतीं माझीं । एकांचे पाळण एकांसी भांडण । चाड कवणिये काजीं । अधिक असे उणें कवण कवण्या गुणें । हे माव न कळे चि तुझी । ह्मणोनि चिंतनीं राहिलों श्रीपती। तुका ह्मणे भाक माझी ॥3॥ 1752 आणिकां छळावया जालासी शाहाणा । स्वहिता घातले खानें । आडिके पैके करूनि सायास । कृपणें सांचलें धन। न जिरे क्षीर श्वानासी भिक्षतां । याती तयाचा गुण । तारुण्यदशे अधम मातला । दवडी हात पाय कान ॥1॥ काय जालें यांस वांयां कां ठकले । हातीं सांपडलें टाकीतसे । घेउनि स्फटिकमणी टाकी चिंतामणी । नागवले आपुले इच्छे ॥ध्रु.॥ सिद्धीं सेविलें सेविती अधम । पात्रासारिखे फळ । सिंपिला मोतीं जन्मलें स्वाती । वरुषलें सर्वत्र जळ । कापुस पट नये चि कारणा । तयास पातला काळ । तें चि भुजंगें धरिलें कंठीं । मा विष जालें त्याची गरळ ॥2॥ भक्षूनि मिष्टान्न घृतसाकर । सहित सोलुनि केळें । घालुनियां घसां अंगोिळया। हाते वांत करू बळें । कुंथावयाची आवडी बोंबा । उन्हवणी रडवी बाळें । तुका ह्मणे जे जैसें करिती । ते पवती तैसीं च फळें ॥3॥ 1753 चंदनाचे गांवीं सर्पांच्या वसति । भोगिते ते होती द्वीपांतरीं ॥1॥ एका ओझें एका लाभ घडे देवा । संचिताचा ठेवा वेगळाला ॥ध्रु.॥ क्षीराची वसति अशुद्ध सेवावें । जवळी तें जावें भोगें दुरी ॥2॥ तुका ह्मणे ऐसी बुिद्ध ज्याची जड । त्याहुनि दगड बरे देवा ॥3॥ 1754 तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव-वाचाकायामन ॥1॥ भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥ नेणतां सोसिली तयाची आटणी । नव्हतां ही कोणी कांहीं माझीं ॥2॥ वर्म नेणें दिशा हिंडती मोकट । इंिद्रयें सुनाट दाही दिशा ॥3॥ वेरझारीफेरा सिणलों सायासीं । आतां हृषीकेशी अंगिकारीं ॥4॥ तुका ह्मणे मन इंिद्रयांचे सोइऩ । धांवे यासी काइऩ करूं आतां ॥5॥ 1755 स्वयें पाक करी । संशय तो चि धरी । संदेहसागरीं। आणीक परी बुडती ॥1॥ जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख। देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥ तो चि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥2॥ तो चि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणि करियेले ॥3॥ अखंड ते ध्यान । समबुिद्ध समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥4॥ करणें जयासाटीं । जो नातुडे कवणे आटी । तुका ह्मणे साटी । चित्तवित्तेंवांचूनि ॥5॥ 1756 माझिया संचिता । दृढ देखोनि बिळवंता । पळसी पंढरिनाथा । भेणे आतां तयाच्या ॥1॥ तरि मज कळलासी । नव्हतां भेटी जाणीवेसी । एक संपादिसी । मान करिसी लोकांत ॥ध्रु.॥ तरि हें प्रारब्ध जी गाढें । कांहीं न चले तयापुढें । काय तुज म्यां कोंडें । रें सांकडें घालावें ॥2॥ भोगधीपति क्रियमाण । तें तुज नांगवे अजून। तरि का वांयांविण । तुज म्यां सीण करावा ॥3॥ तुज नव्हतां माझें कांहीं । परि मी न संडीं भिHसोइऩ । हो कां भलत्या ठायीं । कुळीं जन्म भलतैसा ॥4॥ तूं भितोसि माझिया दोषा । कांहीं मागणें ते आशा । तुका ह्मणे ऐसा । कांहीं न धरीं संकोच ॥5॥ 1757 लोकमान देहसुख । संपित्तउपभोग अनेक । विटंबना दुःख । तुझिये भेटीवांचूनि ॥1॥ तरी मज ये भेट ये भेट । काय ठाकलासी नीट । थोर पुण्यें वीट । तुज दैवें चि लाधली ॥ध्रु.॥ काय ब्रह्मYाान करूं कोरडें । रितें मावेचें मापाडें । भेटीविण कुडें । तुझिये अवघें मज वाटे ॥2॥ आत्मिस्थतीचा विचार । काय करूं हा उद्धार। न देखतां धीर । चतुर्भुज मज नाहीं ।3॥ रिद्धीसिद्धी काय करूं । अथवा अगम्य विचारू । भेटीविण भारु । तुझिये वाटे मज यांचा ॥4॥ तुजवांचूनि कांहीं व्हावें । ऐसें नको माझिया जीवें। तुका ह्मणे द्यावें । दरुषण पायांचें ॥5॥ 1758 तुझा ह्मणवून तुज नेणें । ऐसें काय माझें जिणें॥1॥ तरि मज कवणाचा आधार । करोनियां राहों धीर ॥ध्रु.॥ काय शब्दीं चि ऐकिला । भेटी नव्हतां गा विठ्ठला ॥2॥ तुका ह्मणे आतां । अभय देइप पंढरिनाथा ॥3॥ 1759 उद्धवअक्रूरासी । आणीक व्यासआंबॠषी । रुक्मांगदाप्रल्हादासी । दाविलें तें दाखवीं ॥1॥ तरि मी पाहेन पाहेन। तुझे श्रीमुखचरण । उताविळ मन । तयाकारणें तेथें ॥ध्रु.॥ जनकश्रुतदेवा करीं । कैसा शोभलासी हरी । विदुराच्या घरीं । कण्या धरी कवतुकें ॥2॥ पांडवा अकांतीं । तेथें पावसी स्मरती । घातलें द्रौपदी । यागीं बिरडें चोळीचें ॥3॥ करी गोपीचें कवतुक । गाइऩगोपाळांसी सुख । दावीं तें चि मुख । दृष्टी माझ्या आपुलें ॥4॥ तरि तूं अनाथाचा दाता । मागतियां शरणागतां । तुका ह्मणें आतां। कोड पुरवीं हें माझें ॥5॥ 1760 मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देइप मज हरी कृपादान ॥1॥ प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥ सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥2॥ तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥3॥ संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥4॥ तुका ह्मणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥5॥ 1761 भाव नाहीं काय मुद्रा वाणी । बैसे बगळा निश्चळ ध्यानीं ॥1॥ न मनी नाम न मनी त्यासी । वाचाळ शब्द पिटी भासी ॥ध्रु.॥ नाहीं चाड देवाची कांहीं । छळणें टोंके तस्करघाइऩ ॥2॥ तुका ह्मणे त्याचा संग । नको शब्द स्पर्शअंग ॥3॥ 1762 दिनदिन शंका वाटे । आयुष्य नेणवतां गाढें ॥1॥ कैसीं भुललीं बापुडीं । दंबविषयांचे सांकडीं ॥ध्रु.॥ विसरला मरण। त्याची नाहीं आठवण ॥2॥ देखत देखत पाहीं । तुका ह्मणे आठव नाहीं ॥3॥ 1763 माझें मज आतां न देखें निरसतां । ह्मणऊन आधार केला । संसाराची आस सांडुनि लौकिक । जीव भाव तुज दिला । नव्हतीं माझीं कोणी मी कवणांचा । अर्थ मोहो सांडवला । तारीं मारीं करीं भलतें दातारा । होऊन तुझा आतां ठेलों रे ॥1॥ असो माझें कोडें तुज हे सांकडें । मी असेन निवाडें सुखरूप । बाळकासी चिंता काय पोटवेथा । जया शिरीं मायबाप ॥ध्रु.॥ पापपुण्यें श्रुति आटिल्या। शास्त्रांस न लगे चि ठाव । विधिनिषिधें गोविलीं पुराणें वेदांसी तो अहंभाव । ओंकाराचें मूळ व्यापिलें माया । तेथें न धरे च भाव । ह्मणऊन काबाड सांडिलें उपसतां । धरिलें तुझें चि नांव ॥2॥ तनमनइंिद्रयें ठेवूनि राहिलों । सर्व आशा तुझे पायीं । तप तीर्थ दान करवूं कवणा । हातीं अधीन तें मज काइऩ । आहिक्यें परत्रें चाड नाहीं सर्वथा । जन्म सदा मज देहीं । मायामोहपाश करीं विष तैसें । तुका ह्मणे माझ्याठायीं ॥3॥ 1764 तुझें नाम गोड नाम गोड । पुरे कोड सकळ ही ॥1॥ रसना येरां रसां विटे । घेतां घोट अधिक हें ॥ध्रु.॥ आणिकां रसें मरण गांठी । येणें तुटी संसारें ॥2॥ तुका ह्मणे आहार जाला। हा विठ्ठला आह्मांसी ॥3॥ 1765 धालों सुखें ढेकर देऊं । उमटे जेवूं तोंवरी ॥1॥ क्रीडा करूं निरांजनीं । न पुरे धणी हरिसवें ॥ध्रु.॥ अवघे खेळों अवघ्यामधीं । डाइप न पडों ऐसी बुिद्ध ॥2॥ तुका ह्मणे वांचवीत। आह्मां सत्ता समर्थ ॥3॥ 1766 एकल्या नव्हे खेळ चांग । धरिला संग ह्मणऊनि॥1॥ उमटे तेव्हां कळे नाद । भेदाभेद निवडेना ॥ध्रु.॥ दुसरा परी एक ऐसा । वजे रिसा निकुरें ही ॥2॥ तुका ह्मणे कळत्यां कळे । येर खेळे खेळ ह्मुण ॥3॥ 1767 बोलविले जेणें । तो चि याचें गुहए जाणे ॥1॥ मी तों काबाडाचा धनी । जेवूं मागावें थिंकोनि ॥ध्रु.॥ मजुराच्या हातें । माप जालें गेलें रितें ॥2॥ जाला पुरविता । पांडुरंग माझा पिता॥3॥ मायबापासवें । बाळें कौतुकें खेळावें ॥4॥ जैसा करिती धंदा । तैसा पडोनियां छंदा ॥5॥ त्याच्या साच गाइऩ ह्मैसी । येणें खेळावें मातीशीं ॥6॥ तुका ह्मणे बोल । माझा बोलतो विठ्ठल ॥7॥ 1768 कां हो तुह्मी माझी वदविली वाणी । नेदा हे निवडूनि पांडुरंगा ॥1॥ आणीक म्यां कोणां पुसावा विचार । मुळीं संवसार दुराविला ॥ध्रु.॥ स्वामिसेवा ह्मुण घेतली पदरीं । सांगितलें करीं कारण तें ॥2॥ तुका ह्मणें नाहीं शिकविलें जेणें । तो याच्या वचनें उगा राहे ॥3॥ 1769 सेवकासी आYाा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥1॥ आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं टळों नये ॥ध्रु.॥ समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥2॥ तुका ह्मणे तरी ह्मणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥3॥ 1770 नये पुसों आYाा केली एकसरें । आह्मांसी दुसरें आतां नाहीं ॥1॥ ज्याचें तो बिळवंत सर्व निवारिता । आह्मां काय चिंता करणें लागें ॥ध्रु.॥ बुद्धीचा जनिता विश्वाचा व्यापक । काय नाहीं एक अंगीं तया ॥2॥ तुका ह्मणे मज होइऩल वारिता । तरी काय सत्ता नाहीं हातीं ॥3॥ 1771 बिळवंत आह्मी समर्थाचे दास । घातली या कास किळकाळासी ॥1॥ तेथें मानसाचा कोण आला पाड । उलंघोनि जड गेलों आधीं ॥ध्रु.॥ संसाराचे बळी साधिलें निधान । मारिले दुर्जन षडवर्ग ॥2॥ तुका ह्मणे एक उरला धरिता ठाव । येर केले वाव तृणवत ॥3॥ 1772 एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥1॥ मोडूनियां वाटा सूक्षम सगर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥ लावूनि मृदांग टाळश्रुतिघोष । सेवूं ब्रह्मरस आवडीनें ॥2॥ तुका ह्मणे महापातकी पतित । ऐसियांचे हित हेळामात्रें ॥3॥ 1773 वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥1॥ ह्मणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥ पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥2॥ तुका ह्मणे खूण न कळे चि निरुती। सांपडलों हातीं अहंकाराचे ॥3॥ 1774 आतां काढाकाढी करीं बा पंढरिराया । नाहीं तरी वांयां गेलों दास ॥1॥ जाणतां बैसलों दगडाचे नावे । तिचा धर्म घ्यावे प्राण हा चि ॥ध्रु.॥ मनाचा स्वभाव इंिद्रयांचे ओढी । पतनाचे जोडी वरी हांव ॥2॥ तुका ह्मणे जाली अंधऑयाची परी । आतां मज हरी वाट दावीं ॥3॥ 1775 सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥1॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥ भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥2॥ परउपकार घडे तो भला । नाठएाळ तया दया नाहीं ॥3॥ जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा॥4॥ हित तें अनहित केलें कैसें । तुका ह्मणे पिसें लागलें यास ॥5॥ 1776 तुझें नाम मुखीं न घेतां आवडी । जिव्हा ते चि घडी झडो माझी ॥1॥ हें मज देइप हें मज देइप । आणिक दुजें कांहीं न मगें तुज ॥ध्रु.॥ बहिर कान तुझी कीर्ती नाइकतां । पाय न देखतां जात डोळे ॥3॥ मना तुझें ध्यान नाहीं नित्य काळ । धिग तें चांडाळ जळो जळो ॥3॥ हातपाय तेणें पंथ न चलतां । जावे ते अनंता गळोनियां ॥4॥ तुजविण जिणें नाहीं मज चाड । तुका ह्मणे गोड नाम तुझें ॥5॥ 1777. ह्मणसी होऊनी नििंश्चता । हरूनियां अवघी चिंता । मग जाऊं एकांता भजन करूं । संसारसंभ्रमें आशा लागे पाठी । तेणें जीवा साटी होइऩल तुझ्या ॥1॥ सेकीं नाडसील नाडसील । विषयसंगें अवघा नाडसील । मागुता पडसील भवडोहीं ॥ध्रु.॥ शरीर सकळ मायेचा बांधा । यासी नाहीं कधीं अराणूक । करिती तडातोडी आंत बाहएात्कारीं । ऐसे जाती चारी दिवस वेगीं ॥2॥ मोलाची घडी जाते वांयांविण । न मिळे मोल धन देतां कोडी । जागा होइप करीं हिताचा उपाय । तुका ह्मणे हाय करिसी मग ॥3॥ 1778 कनवाळू कृपाळू भHांलागीं मोही । गजेंद्राचा धांवा तुवां केला विठाइऩ ॥1॥ पांडुरंगे ये वो पांडुरंगे । जीवाचे जिवलगे ये वो पांडुरंगे ॥ध्रु.॥ भHांच्या कैवारें कष्टलीस विठ्ठले । आंबॠषीकारणें जन्म दाहा घेतले ॥2॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार केला । विदारूनि दैत्य प्रेमपान्हा पाजिला ॥3॥ उपमन्याकारणें कैसी धांवसी लवलाहीं । पाजी प्रेमपान्हा क्षीरसागराठायीं ॥4॥ कौरवीं पांचाळी सभेमाजी आणिली । वस्त्रहरणीं वस्त्रें कैसी जाली माउली ॥5॥ दुर्वास पातला धर्मा छळावया वनीं । धांवसी लवलाहीं शाखादेठ घेऊनि ॥6॥ कृपाळू माउली भुिHमुिHभांडार । करीं माझा अंगीकार तुका ह्मणे विठ्ठले ॥7॥ 1779 कवणा पाषाणासी धरूनि भाव । कवणावरी पाव ठेवूं आतां । ह्मणऊनि नििश्चत राहिलों मनीं । तूं चि सर्वां खाणी देखोनियां ॥1॥ कवणाचें कारण न लगे कांहीं । सर्वांठायीं तूं एक। कायावाचामन ठेविलें तुझ्या पायीं । आता उरलें काइऩ न दिसे देवा ॥ध्रु.॥ जळें जळ काय धोविलें एक । कवण तें पातक हरलें तेथें । पापपुण्य हे वासना सकळ । ते तुज समूळ समपिऩली ॥2॥ पितरस्वरूपी तूं चि जनादऩन। सव्य तें कवण अपसव्य । तुका ह्मणे जीत पिंड तुह्मां हातीं। देऊनि नििंश्चती मानियेली ॥3॥ 1780 सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥1॥ न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥ मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥2॥ पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥3॥ पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥4॥ जन साहेभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥5॥ कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥6॥ तुका ह्मणे मज तुझाची भरवसा । ह्मणऊनि आशा मोकलिली ॥7॥ 1781 देवाचा भH तो देवासी गोड । आणिकांसी चाड नाहीं त्याची । कवणाचा सोइरा नव्हे च सांगाती । अवघियां हातीं अंतरला ॥1॥ निष्काम वेडें ह्मणतील बापुडे । अवघियां सांकडें जाला कैसा । माझें ऐसें तया न ह्मणत कोणी । असे रानीं वनीं भलते ठायीं ॥ध्रु.॥ प्रातःस्नान करी विभूतिचर्चन । दखोनिया जन निंदा करी । कंठीं तुळसीमाळा बैसोनि निराळा । ह्मणती या चांडाळा काय जालें ॥2॥ गातां शंका नाहीं बैसे भलते ठायीं । शिव्या देती आइऩ बाप भाऊ । घरी बाइल ह्मणे कोठें व्याली रांड । बरें होतें शंड मरता तरी ॥3॥ जन्मोनि जाला अवघियां वेगळा । ह्मणोनि गोपाळा दुर्लभ तो । तुका ह्मणे जो संसारा रुसला । तेणें चि टाकिला सिद्धपंथ ॥4॥ 1782 कस्तुरी भिनली जये मृित्तके । तयेसी आणिके कैसी सरी ॥1॥ लोखंडाचे अंगीं लागला परिस । तया आणिकास कैसी सरी ॥2॥ तुका ह्मणे मी न वजें यातीवरी । पूज्यमान करीं वैष्णवांसी ॥ ।3॥ 1783 अनुहात ध्वनि वाहे सकळां पिंडीं । राम नाहीं तोंडीं कैसा तरे ॥1॥ सकळां जीवांमाजी देव आहे खरा । देखिल्या दुसरा विण न तरे ॥ध्रु.॥ Yाान सकळांमाजी आहे हें साच । भHीविण तें च ब्रह्म नव्हे ॥2॥ काय मुद्रा कळल्या कराव्या सांगतां । दीप न लगतां उन्मनीचा ॥3॥ तुका ह्मणे नका पिंडाचें पाळण । स्थापू नारायण आतुडेना ॥4॥ 1784 नेणें अर्थ कांहीं नव्हती माझे बोल । विनवितों कोपाल संत झणी ॥1॥ नव्हती माझे बोल बोले पांडुरंग । असे अंगसंगें व्यापूनिया ॥ध्रु.॥ मज मूढा शिH कैंचा हा विचार । निगमादिकां पार बोलावया ॥2॥ राम कृष्ण हरी मुकुंदा मुरारि । बोबडा उत्तरीं हें चि ध्यान ॥3॥ तुका ह्मणे गुरुकृपेचा आधार । पांडुरंगें भार घेतला माझा ॥4॥ 1785 देवासी लागे सकळांसी पोसावें । आह्मां न लगे खावें काय चिंता ॥1॥ देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥ देवासी उत्पित्त लागला संहार । आह्मां नाहीं फार थोडें काहीं ॥2॥ देवासी काम लागला धंदा । आह्मासी ते सदा रिकामीक ॥3॥ तुका ह्मणे आह्मी भले देवाहून । विचारितां गुण सर्वभावें ॥4॥ 1786 घेइऩन मी जन्म याजसाठीं देवा । तुझी चरणसेवा साधावया ॥1॥ हरिनामकीर्तन संतांचे पूजन । घालूं लोटांगण महाद्वारीं ॥ध्रु.॥ आनंदें निर्भर असों भलते ठायीं । सुखदुःख नाहीं चाड आह्मां ॥2॥ आणीक सायास न करीं न धरीं आस । होइऩन उदास सर्व भावें ॥3॥ मोक्ष आह्मां घरीं कामारी ते दासी । होय सांगों तैसी तुका ह्मणे ॥4॥ 1787 देवा तुज मज पण । पाहों आगळा तो कोण ॥1॥ तरी साच मी पतित । तूं च खोटा दिनानाथ । ग्वाही साधुसंत जन। करूनि अंगीं लावीन ॥ध्रु.॥ आह्मी धरिले भेदाभेद । तुज नव्हे त्याचा छेद ॥2॥ न चले तुझे कांहीं त्यास । आह्मी बळकाविले दोष ॥3॥ दिशा भरल्या माझ्या मनें । लपालासी त्याच्या भेणें ॥4॥ तुका ह्मणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥5॥ 1788 लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुहए भाव शुद्ध बोला ॥1॥ अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥2॥ तुका ह्मणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥3॥ 1789 नव्हे ब्रह्मYाान बोलतां सिद्ध । जंव हा आत्मबोध नाहीं चित्तीं ॥1॥ काय करिसी वांयां लटिका चि पाल्हाळ । श्रम तो केवळ जाणिवेचा ॥ध्रु.॥ मी च देव ऐसें सांगसी या लोकां । विषयांच्या सुखा टोंकोनियां ॥2॥ अमृताची गोडी पुढिलां सांगसी। आपण उपवासी मरोनिया ॥3॥ तुका ह्मणे जरि राहील तळमळ । ब्रह्म तें केवळ सदोदित ॥4॥ 1790 गंगाजळा पाहीं पाठी पोट नाहीं । अवगुण तो कांहीं अमृतासी ॥1॥ रवि दीप कािळमा काय जाणे हिरा । आणिका तिमिरा नासे तेणे ॥ध्रु.॥ कर्पूरकांडणी काय कोंडा कणी । सिंधू मिळवणीं काय चाले ॥2॥ परिस चिंतामणि आणिकांचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥3॥ तुका ह्मणे तैसे जाणा संतजन । सर्वत्र संपूर्ण गगन जैसें ॥4॥ 1791 परिस काय धातु । फेडितो निभ्रांतु लोहपांगु ॥1॥ काय तयाहूनि जालासी बापुडें । फेडितां सांकडें माझे एक ॥ध्रु.॥ कल्तपरु कोड पुरवितो रोकडा । चिंतामणि खडा चिंतिलें तें ॥2॥ चंदनांच्या वासें वसतां चंदन । होती काष्ठ आन वृक्षयाती ॥3॥ काय त्याचें उणें जालें त्यासी देतां । विचारीं अनंता तुका ह्मणे॥4॥ 1792 तोडुनि पुष्पवटिका फळवृक्षयाति । बाभळा राखती करूनि सार ॥1॥ कोण हित तेणें देखिलें आपुलें । आणीक पाहिलें सुख काइऩ ॥ध्रु.॥ धान्यें बीजें जेणें जािळलीं सकळें । पेरितो काळें जिरें बीज ॥2॥ मोडोनिया वाटा पुढिलांची सोय । आडरानें जाय घेउनि लोकां ॥3॥ विषाचें अमृत ठेवूनियां नाम । करितो अधम ब्रह्महत्या ॥4॥ तुका ह्मणे त्यास नाइके सांगतां । तया हाल करितां पाप नाहीं ॥5॥ 1793 संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥1॥ जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥ एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥2॥ गांवा जातों ऐसें । न लगे ह्मणावें तें कैसें ॥3॥ स्वप्नाचे परी । जागा पाहे तंव घरीं ॥4॥ तुका ह्मणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥5॥ 1794 आण काय सादर । विशीं आह्मां कां निष्ठ‍ ॥1॥ केलें भH तैसें देइप । तुझें प्रेम माझ्याठायीं ॥ध्रु.॥ काय पंगतीस कोंडा । एकांतासी साकरमांडा ॥2॥ काय एकपण । पोतां घालूनि गांठी खूण ॥3॥ काय घ्यावें ऐसें । त्या आपण अनारिसें ॥4॥ तुका ह्मणे मधीं । आतां तोडूं भेद बुद्धी ॥5॥ 1795 चित्त तुझ्या पायीं । ठेवुनि जालों उतराइऩ ॥1॥ परि तूं खोटा केशीराजा । अंतपार न कळे तुझा ॥ध्रु.॥ आह्मी सर्वस्वें उदार । तुज देऊनियां धीर ॥2॥ इंिद्रयांची होळी । संवसार दिला बळी ॥3॥ न पडे विसर । तुझा आह्मां निरंतर ॥4॥ प्रेम एकासाटी। तुका ह्मणे न वेचे गांठी ॥5॥ 1796 आह्मी पतित ह्मणोनि तुज आलों शरण । करितों चिंतन दिवस रात्रीं । नाहीं तरी मज काय होती चाड । धरावया भीड तुज चित्तीं ॥1॥ आह्मां न तारावें तुह्मी काय करावें । सांगीजोजी भावें नारायणा ॥ध्रु.॥ अन्याय एकाचा अंगीकार करणें। तया हातीं देणें लाज ते चि । काय ते शूरत्व मिरवूनि बोलणें । जनामाजी दावणें बळरया ॥2॥ पोहएा अन्नछत्र घालूनियां घरीं । दंडितो बाहेरी आलियासी । नव्हे कीर्त कांहीं न माने लोकां । काय विटंबणा तैसी ॥3॥ प्रत्यक्षासी काय द्यावें हें प्रमाण । पाहातां दर्पण साक्ष काइऩ । तुका ह्मणे तरी आह्मां का न कळे । तरलों किंवा आह्मी नाहीं ॥4॥ 1797 काग बग रिठा मारिले बाळपणीं । अवघी दैत्यखाणी बुडविली ॥1॥ तो मज दावा तो मज दावा । नंदनंदन जीवा आवडे तो ॥ध्रु.॥ गोवर्धन गिरी उचलिला करीं । गोकुळ भीतरी राखियेलें ॥2॥ बघुनि भौमासुरा आणिल्या गोपांगना । राज्य उग्रसेना मथुरेचें ॥3॥ पांडव जोहरीं राखिले कुसरी । विवराभीतरीं चालविले॥4॥ तुका ह्मणे हा भHांचा कृपाळ । दुष्टजना काळ नारायण ॥5॥ 1798 तुजविण देवा । कोणा ह्मणे माझी जिव्हा ॥1॥ तरि हे हो कां शतखंड । पडो झडोनियां रांड ॥ध्रु.॥ कांहीं इच्छेसाटीं । करिल वळवळ करंटी ॥2॥ तुका ह्मणे कर । कटीं तयाचा विसर॥3॥ 1799 आह्मां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम॥1॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां॥ध्रु.॥ आसनीं भोजनीं शयनीं । दुजें नाहीं ध्यानीं मनीं ॥2॥ तुका ह्मणे कृपानिधी । माझी तोडिली उपाधी ॥3॥ 1800 नव्हें कांहीं कवणाचा । भाव जाणवला साचा ॥1॥ ह्मणोनि तुझ्या पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥ध्रु.॥ शरीर जायाचें कोंपट । याची काय खटपट ॥2॥ तुका ह्मणे वांयांविण । देवा कळों आला सीण ॥3॥ [[वर्ग:गाथा]] h127zy6w2f17fhj6j1c7r11360bqfwy तुकाराम गाथा/ १८०१ ते २१०० 0 1539 36911 36878 2026-09-19T19:41:55Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36911 wikitext text/x-wiki 1801 रज्जु धरूनियां हातीं । भेडसाविलीं नेणतीं । कळों येतां चित्तीं । दोरी दोघां सारिखी ॥1॥ तुह्मांआह्मांमध्यें हरी । जाली होती तैसी परी । मृगजळाच्या पुरीं । ठाव पाहों तरावया ॥ध्रु.॥ सरी चिताक भोंवरी । अळंकाराचिया परी । नामें जालीं दुरी । एक सोनें आटितां ॥2॥ पिसांचीं पारवीं । करोनि बाजागिरी दावी । तुका ह्मणे तेवीं । मज नको चाळवूं ॥3॥ 1802 नेघें तुझें नाम । न करीं सांगितलें काम ॥1॥ वाढे वचनें वचन । दोष उच्चारितां गुण ॥ध्रु.॥ आतां तुझ्या घरा । कोण करी येरझारा ॥2 ॥ तुका ह्मणे ठायीं । मजपाशीं काय नाहीं ॥3॥ 1803 व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा॥1॥ एका नामा नाहीं ताळ । केली सहजरांची माळ ॥ध्रु.॥ पाहों जातां घाइऩ। खेळसी लपंडाइऩ ॥2॥ तुका ह्मणे चार । बहु करितोसी फार॥3॥ 1804 लटिका चि केला । सोंग पसारा दाविला ॥1॥ अवघा बुडालासी ॠणें । बहुतांचे देणें घेणें ॥ध्रु.॥ लावियेलीं चाळा। बहू दावूनि पुतळा ॥2॥ तुका ह्मणे हात । आह्मी अवरिली मात ॥3॥ 1805 दाखवूनि आस । केला बहुतांचा नास ॥1॥ थोंटा झोडा शिरोमणी । भेटलासी नागवणी ॥ध्रु.॥ सुखाचें उत्तर । नाहीं मुदलासी थार ॥2॥ तुका ह्मणे काय । तुझे घ्यावें उरे हाय ॥3॥ 1806 लाज ना विचार । बाजारी तूं भांडखोर ॥1॥ ऐसें ज्याणें व्हावें । त्याची गांठी तुजसवें ॥ध्रु.॥ फेडिसी लंगोटी । घेसी सकळांसी तुटी ॥2॥ तुका ह्मणे चोरा । तुला आप ना दुसरा ॥3॥ 1807 ठाव नाहीं बुड । घरें वसविसी कुड ॥1॥ भलते ठायीं तुझा वास । सदा एरवी उदास ॥ध्रु.॥ जागा ना निजेला । धाला ना भुकेला ॥2॥ न पुसतां भलें । तुका ह्मणे बुझें बोलें ॥3॥ 1808 श्वाना दिली सवे । पायांभोंवतें तें भोंवे ॥1॥ तैसी जाली मज परी । वसे निकट सेजारीं ॥ध्रु.॥ जेवितां जवळी । येऊनियां पुंस घोळी ॥2॥ कोपेल तो घनी । तुका ह्मणे नेणें मनीं॥3॥ 1809 वटवट केली । न विचारितां मना आली ॥1॥ मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥ उचित न कळे । जिव्हा भलतें चि बरळे ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥3॥ 1810 जीवें व्हावें साटी । पडे संवसारें तुटी ॥1॥ ऐशीं बोलिलों वचनें । सवें घेउनि नारायण ॥ध्रु.॥ नाहीं जन्मा आलों । करील ऐसें नेदीं बोलों ॥2॥ ठाव पुसी सेणें । तुका ह्मणे खुंटी येणें ॥3॥ 1811 आता पंढरीराया । माझ्या निरसावें भया ॥1॥ मनीं राहिली आशंका । स्वामिभयाची सेवका ॥ध्रु.॥ ठेवा माथां हात । कांहीं बोला अभयमात ॥2॥ तुका ह्मणे लाडें । खेळें ऐसें करा पुढें॥3॥ 1812 कवतुकवाणें । बोलों बोबडएा वचनें ॥1॥ हें तों नसावें अंतरीं । आह्मां धरायाचें दुरी ॥ध्रु.॥ स्तुति तैसी निंदा । माना सम चि गोविंदा ॥2॥ तुका ह्मणे बोलें । मज तुह्मी शिकविलें॥3॥ 1813 असो मागें जालें । पुडें गोड तें चांगलें ॥1॥ आतां माझे मनीं । कांहीं अपराध न मनीं ॥ध्रु.॥ नेदीं अवसान । करितां नामाचें चिंतन ॥2॥ तुका ह्मणे बोले । तुज आधीं च गोविलें॥3॥ 1814 मातेविण बाळा । आणिक न माने सोहळा ॥1॥ तैसें जालें माझ्या चित्ता । तुजविण पंढरिनाथा ॥ध्रु.॥ वाट पाहेमेघा बिंदु । नेघे चातक सरिता सिंधू ॥2॥ सारसांसी निशीं । ध्यानरवीच्या प्रकाशीं ॥3॥ जीवनाविण मत्स्य । जैसें धेनूलागीं वत्स ॥4॥ पतिव्रते जिणें । भ्रताराच्या वर्त्तमानें ॥5॥ कृपणाचें धन । लोभालागीं जैसें मन ॥6॥ तुका ह्मणे काय । तुजविण प्राण राहे॥7॥ 1815 तुजऐसा कोणी न देखें उदार । अभयदानशूर पांडुरंगा ॥1॥ शरण येती त्यांचे न विचारिसी दोष । न मागतां त्यांस अढळ देसी ॥ध्रु.॥ धांवसी आडणी ऐकोनियां धांवा । कइवारें देवा भHांचिया ॥2॥ दोष त्यांचे जाळी कल्पकोटिवरी । नामासाटीं हरि आपुलिया ॥3॥ तुका ह्मणे तुज वाणूं कैशा परी । एक मुख हरी आयुष्य थोडें ॥4॥ 1816 काय तुझे उपकार पांडुरंगा । सांगों मी या जगामाजी आतां ॥1॥ जतन हें माझें करूनि संचित । दिलें अवचित आणूनियां॥ध्रु.॥ घडल्या दोषांचें न घली च भरी । आली यास थोरी कृपा देवा ॥2॥ नव्हतें ठाउकें आइकिलें नाहीं । न मगतां पाहीं दान दिलें ॥3॥ तुका ह्मणे याच्या उपकारासाटीं । नाहीं माझें गाठीं कांहीं एंक ॥4॥ 1817 वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥1॥ आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥ नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥2॥ तुका ह्मणे ऐसी धरितों वासना । होइप नारायणा साहए मज ॥3॥ 1818 सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥1॥ ह्मणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥ काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चित्ता उपजतें॥2॥ तुका ह्मणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार टाकीं ॥3॥ 1819 आतां नको चुकों आपुल्या उचिता । उदारा या कांता रखुमाइऩच्या ॥1॥ आचरावे दोष हें आह्मां विहित । तारावे पतित तुमचें तें ॥ध्रु.॥ आह्मी तों आपुलें केलेसें जतन । घडो तुह्मांकून घडेल ते ॥2॥ तुका ह्मणे विठो चतुराच्या राया । आहे ते कासया मोडों देसी ॥3॥ 1820 मुखें बोलावें तें जीविंचें जाणसी । विदित पायांपाशीं सर्व आहे ॥1॥ आतां हें चि भलें भाकावी करुणा । विनियोग तो जाणां तुह्मी त्याचा ॥ध्रु.॥ आपलें तों येथें केलें नव्हे कांहीं । साधनाचा वांहीं पडों नये ॥2॥ तुका ह्मणे देह दिला पिंडदान । वेळोवेळां कोण चिंता करी ॥3॥ 1821 कामातुरा भय लाज ना विचार । शरीर असार तृणतुल्य ॥1॥ नवल हे लीळा करात्याचें लाघव । प्रारब्धें भाव दाखविले ॥ध्रु.॥ लोभालोभ एका धनाचिये ठायीं । आणिकांची सोइऩ चाड नाहीं ॥2॥ तुका ह्मणे भूक न विचारी प्रकार । योजे तें चि सार यथाकाळें ॥3॥ 1822 बांधे सोडी हें तों धन्याचिये हातीं । हेंकडें गोविती आपणां बळें ॥1॥ भुललियासी नाहीं देहाचा आठव । धोत†यानें भाव पालटिला ॥ध्रु.॥ घरांत रिघावें दाराचिये सोइऩ । भिंतीसवें डोइऩ घेऊनि फोडी ॥2॥ तुका ह्मणे देवा गेलीं विसरोन । आतां वर्म कोण दावी यांसी ॥3॥ 1823 कवण जन्मता कवण जन्मविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥1॥ कवण हा दाता कवण हा मागता । न कळे कृपावंता माव तुझी ॥ध्रु.॥ कवण भोगिता कवण भोगविता । न कळे कृपावंता माव तुझी ॥2॥ कवण ते रूप कवण अरूपता । न कळे कृपावंता माव तुझी ॥3॥ सर्वां ठायीं तूं चि सर्व ही जालासी। तुका ह्मणे यासी दुजें नव्हे ॥4॥ 1824 जेथें देखें तेथें तुझी च पाउलें । विश्व अवघें कोंदाटलें। रूप गुण नाम अवघा मेघश्याम । वेगळें तें काय उरलें । जातां लोटांगणीं अवघी च मेदिनी । सकळ देव पाट जालें । सदा पर्वकाळ सुदिन सुवेळ । चित्त प्रेमें असे धालें ॥1॥ अवघा आह्मां तूं च जालासी देवा । संसार हेवा कामधंदा । न लगे जाणें कोठें कांहीं च करणें । मुखीं नाम ध्यान सदा ॥ध्रु.॥ वाचा बोले ते तुझे चि गुणवाद। मंत्रजप कथा स्तुति । भोजन सारूं ठायीं फल तांबोल कांहीं । पूजा नैवेद्य तुज होती । चालतां प्रदक्षणा निद्रा लोटांगण । दंडवत तुजप्रति । देखोन दृष्टी परस्परें गोष्टी । अवघ्या तुझ्या मूतिऩ॥2॥ जाल्या तीर्थरूप वावी नदी कूप । अवघें गंगाजळ जालें। महाल मंदिरें माडएा तनघरें । झोपडएा अवघीं देव देवाइलें। ऐकें कानीं त्या हरिनामध्वनी । नाना शब्द होत जाले । तुका ह्मणे या विठोबाचे दास । सदा प्रेमसुखें धाले ॥3॥ 1825 जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥1॥ माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठ‍ पांडुरंगा ॥ध्रु.॥ यातिहीन नये ऐकों ज्यां वेद । तयां दिलें पद वैकुंठींचें ॥2॥ तुका ह्मणे कां रे एकाचा आभार । घेसी माथां भार वाहोनियां ॥3॥ 1826 हरिकथेची आवडी देवा । करितो सेवा दासांची॥1॥ ह्मणोनि हिंडे मागें मागें । घरटी जागे घालितसे ॥ध्रु.॥ निर्लज्ज भोजें नाचत रंगीं । भरतें अंगीं प्रेमाचें ॥2॥ तुका ह्मणे विकलें देवें। आपण भावें संवसाटी ॥3॥ 1827 साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥1॥ शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥ वैष्णवांचा संग रामगाणें गाणें । मंडित भूषण अळंकार ॥2॥ भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडी च चाली जावें पायी ॥3॥ मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥4॥ तुका ह्मणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥5॥ 1828 यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी । वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोिळतां॥1॥ आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ध्रु.॥ सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदां श्रुतीं । तो आह्मी भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥2॥ सहजरमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रह्मा ठेला । तेथें माझी देहबुिद्ध तें काइऩ । थोर मी अन्यायी तुका ह्मणे ॥3॥ 1829 कृष्ण गातां गीतीं कृष्ण ध्यातां चित्तीं । ते ही कृष्ण होती कृष्णध्यानें ॥1॥ आसनीं शयनीं भोजनीं जेवितां । ह्मणारे भोगिता नारायण ॥ध्रु.॥ ओविये दळणीं गावा नारायण । कांडितां कांडण करितां काम ॥2॥ नर नारी याति हो कोणी भलतीं । भावें एका प्रीती नारायणा ॥3॥ तुका ह्मणे एका भावें भजा हरी । कांति ते दुसरी रूप एक ॥4॥ 1830 डोिळयां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देइप भेटे पांडुरंगे ॥1॥ बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥ बहु धंदा तुज नाहीं वो आठव । राहिलासे जीव माझा कंठीं ॥2॥ पंढरीस जाती वारकरी संतां । निरोप बहुतां हातीं धाडीं ॥3॥ तुजविण कोण सांवा धांवा करी । ये वो झडकरी पांडुरंगे ॥4॥ काय तुझी वाट पाहों कोठवरी । कृपाळु कांपरी विसरलासी ॥5॥ एक वेळ माझा धरूनि आठव । तुका ह्मणे ये वो न्यावयासी ॥6॥ 1831 अधिक कोंडितां चरफडी । भलतीकडे घाली उडी॥1॥ काय करूं या मना आतां । का विसरातें पंढरिनाथा । करी संसाराची चिंता । वेळोवेळां मागुती ॥ध्रु.॥ भजन नावडे श्रवण । धांवे विषय अवलोकून ॥2॥ बहुत चंचळ चपळ । जातां येतां न लगे वेळ॥3॥ किती राखों दोनी काळ । निजलिया जागे वेळे ॥4॥ मज राखें आतां । तुका ह्मणे पंढरिनाथा ॥5॥ 1832 कंथा प्रावर्ण । नव्हे भिक्षेचें तें अन्न ॥1॥ करीं यापरी स्वहित । विचारूनि धर्म नीत ॥ध्रु.॥ देऊळ नव्हे घर । प्रपंच परउपकार ॥2॥ विधिसेवन काम । नव्हे शब्द रामराम ॥3॥ हत्या क्षत्रधर्म । नव्हे निष्काम तें कर्म ॥4॥ तुका ह्मणे संतीं । करूनि ठेविली आइती ॥5॥ 1833 पडोनियां राहीं । उगा च संतांचिये पायीं ॥1॥ न लगे पुसणें सांगावें । चित्त शुद्ध करीं भावें ॥ध्रु.॥ सहज ते िस्थति। उपदेश परयुिH ॥2॥ तुका ह्मणे भाव । जवळी धरूनि आणी देव॥3॥ 1834 देवाचे घरीं देवें केले चोरी । देवें देव नागवूनि केला भिकारी ॥1॥ धांवणियां धांवा धांवणियां धांवा । माग चि नाहीं जावें कवणिया गांवा ॥ध्रु.॥ सवें चि होता चोर घरिचिया घरीं । फावलियावरी केलें अवघें वाटोळें ॥2॥ तुका ह्मणे येथें कोणी च नाहीं । नागवलें कोण गेलें कोणाचें काइऩ ॥3॥ 1835 अवघे चि निजों नका अवघिये ठायीं । वेळ अवेळ तरी सांभाळावी कांहीं ॥1॥ जतन करा रे जतन करा । घालूं पाहे घरावरी घाला चोरटें ॥ध्रु.॥ सीतरिलीं फार खाती भोंवताले फेरे । गेलें नये हातां सेकीं तळमळ उरे ॥2॥ तुका ह्मणे आह्मी करूं आपलें जतन । न लगे कांहीं कोणां द्यावें उघडा रे कान ॥3॥ 1836 काळोखी खाऊन कैवाड केला धीर । आपुलिया हितें जाले जनामध्यें शूर ॥1॥ कां रें तुह्मी नेणां कां रे तुह्मी नेणां। अल्पसुखासाटीं पडशी विपत्तीचे घाणां ॥ध्रु.॥ नाहीं ऐसी लाज काय तयांपें आगळें । काय नव्हे केलें आपुलिया बळें ॥2॥ तुका ह्मणे तरी सुख अवघें चि बरें । जतन करून हे आपुलालीं ढोरें॥3॥ 1837 जाय परतें काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसें तरी ॥1॥ कां हो केलें तुह्मी निष्ठ‍ देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥ भाग्यवंत त्यांसी सांगितल्या गोष्टी । तें नाहीं अदृष्टीं आमुचिया ॥2॥ तुका ह्मणे तुह्मापासूनि अंतर । न पडे नाहीं िस्थर बुिद्ध माझी ॥3॥ 1838 अनुभवें कळों येतें पांडुरंगा । रुसावें तें कां गा तुह्मांवरी ॥1॥ आवरितां चित्त नावरे दुर्जन । घात करी मन माझें मज ॥ध्रु.॥ अंतरीं संसार भिH बाहएात्कार । ह्मणोनि अंतर तुझ्या पायीं ॥2॥ तुका ह्मणे काय करूं नेणें वर्म । आलें तैसें कर्म सोसूं पुढें ॥3॥ 1839 तुजकरितां होतें आनाचें आन । तारिले पाषाण उदकीं देवा ॥1॥ कां नये कैवार करूं अंगीकार । माझा बहु भार चड जाला ॥ध्रु.॥ चुकलासी ह्मणों तरी जीवांचा ही जीव । रिता नाहीं ठाव उरों दिला ॥2॥ तुका ह्मणे ऐसें काय सत्ताबळ । माझे परी कृपाळ आहां तुह्मी ॥3॥ 1840 फळ देंठींहून झडे । मग मागुतें न जोडे ॥1॥ ह्मणोनि तांतडी खोटी । कारण उचिताचे पोटीं ॥ध्रु.॥ पुढें चढे हात। त्याग मागिलां उचित ॥2॥ तुका ह्मणे रणीं । नये पाहों परतोनि ॥3॥ 1841 अगी देखोनियां सती । अंगीं रोमांच उठती ॥1॥ हा तो नव्हे उपदेश । सुख अंतरीं उल्हासे ॥ध्रु.॥ वित्तगोतांकडे । चित्त न घाली न रडे ॥2॥ आठवूनि एका । उडी घाली ह्मणे तुका ॥3॥ 1842 फळ पिके देंठीं । निमित्य वारियाची भेटी ॥1॥ हा तों अनुभव रोकडा । कळों येतो खरा कुडा ॥ध्रु.॥ तोडिलिया बळें। वांयां जाती काचीं फळें ॥2॥ तुका ह्मणे मन । तेथे आपुलें कारण ॥3॥ 1843 हालवूनि खुंट । आधीं करावा बळकट ॥1॥ मग तयाच्या आधारें । करणें अवघें चि बरें ॥ध्रु.॥ सुख दुःख साहे । हर्षामषाअ भंगा नये ॥2॥ तुका ह्मणे जीवें । आधीं मरोनि राहावें॥3॥ 1844 धांवे माते सोइऩ । बाळ न विचारितां कांहीं ॥1॥ मग त्याचें जाणें निकें । अंग वोडवी कौतुकें ॥ध्रु.॥ नेणे सर्प दोरी । अगी भलतें हातीं धरी ॥2॥ तीविन तें नेणें । आणीक कांहीं तुका ह्मणे ॥3॥ 1845 भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा ॥1॥ आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥ योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥2॥ वंचक त्यासी दोष । तुका ह्मणे मिथ्या सोस॥3॥ 1846 पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥1॥ मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युिH ॥ध्रु.॥ नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥2॥ तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका ह्मणे ॥3॥ 1847 जायांचें अंगुलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥1॥ गुसिळतां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥2॥ तुका ह्मणे नाहीं स्वता भांडवल । भिकेचें तें फोल बीज नव्हे ॥3॥ 1848 न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥1॥ लटिकें चि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ध्रु.॥ निलाजिरीं आह्मी करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥2॥ कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें ॥3॥ तुका ह्मणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥4॥ 1849 नाहीं जालें मोल कळे देतां काळीं । कोण पाहों बळी दोघांमध्यें ॥1॥ आह्मी तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ध्रु.॥ बहु चाळविलें मागें आजिवरी । आतां पुढें हरि जाऊं नेदीं ॥2॥ नव्हती जों भेटी नामाची ओळखी । ह्मणऊनि दुःखी बहु जालें ॥3॥ तुका ह्मणे कांहीं राहों नेदीं बाकी । एकवेळा चुकी जाली आतां ॥4॥ 1850 कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥1॥ काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हा रिघेसी कोणा आड ॥ध्रु.॥ पाडियेला ठायीं तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥2॥ आतां तुह्मां आह्मां उरी तों चि बरें । काय हें उत्तरें वाढवूनि ॥3॥ तुका ह्मणे मज साहए झाले संत । ह्मणऊनि मात फावली हे ॥4॥ 1851 चुकलिया आह्मां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥1॥ चाळविलीं एकें रििद्धसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥ कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाटीं ॥2॥ केलें म्यां जतन आपुलें वचन । ठायींचें धरून होतों पोटीं ॥3॥ तुका ह्मणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥4॥ 1852 कृपावंता कोप न धरावा चित्तीं । छळूं वक्रोHी स्तुती करूं ॥1॥ आह्मी तुझा पार काय जाणों देवा । नेणों कैसी सेवा करावी ते ॥ध्रु.॥ अनंता अरूपा अलक्षा अच्युता । निर्गुणा सचिता सवाौत्तमा ॥2॥ चांगलीं हीं नामें घेतलीं ठेवून । जालासी लाहान भिHकाजा ॥3॥ तुका ह्मणे तुझ्या पायांवरी सदा । मस्तक गोविंदा असो माझा ॥4॥ 1853 आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥1॥ टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥ स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥2॥ जातीचें वाणी मी पोटींचे कुडें । नका मजपुढें ठकाठकी ॥3॥ तुका ह्मणे नाहीं आलें अनुभवा । आधीं च मी देवा कैसें नाचों ॥4॥ 1854 जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा ॥1॥ पत्र कोण मानी वंदितील सिक्का । गौरव सेवका त्या चि मुळें ॥ध्रु.॥ मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय तेव्हां ॥2॥ आतां तूं भोगिता सर्व नारायणा । नको आह्मां दीनां पीडा करूं ॥3॥ आपुलिया हातें देसील मुशारा । तुका ह्मणे खरा तो चि आह्मां ॥4॥ 1855 आमची कां नये तुह्मासी करुणा । किती नारायणा आळवावें ॥1॥ काय जाणां तुह्मी दुर्बळाचें जिणें । वैभवाच्या गुणें आपुलिया ॥ध्रु.॥ देती घेती करिती खटपटा आणिकें । निराळा कौतुकें पाहोनियां ॥2॥ दिवस बोटीीं आह्मीं धरियेलें माप । वाहातों संकल्प स्वहिताचा ॥3॥ तुका ह्मणे मग देसी कोण्या काळें । चुकुर दुर्बळें होतों आह्मी ॥4॥ 1856 तुह्मां आह्मां तुटी होइऩल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥1॥ वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥ सारिलें संचित होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥2॥ जावें चि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥3॥ तुका ह्मणे आह्मां हा चि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥4॥ 1857 देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें ॥1॥ देव गांढएाळ देव गांढएाळ । देखोनियां बळ लपतसे ॥2॥ देव तर काइऩ देव तर काइऩ । तुका ह्मणे राइऩ तरी मोटी ॥3॥ 1858 देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा॥1॥ देव उदार देव उदार । थोडएासाटीं फार देऊं जाणे ॥2॥ देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥3॥ 1859 देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥1॥ देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥ देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥2॥ देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥3॥ देव न व्हावा देव न व्हावा। तुका ह्मणे गोवा करी कामीं ॥4॥ 1860 देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी॥1॥ देव अकुळी देव अकुळी । भलते ठायीं सोयरीक ॥2॥ देव लिगाडएा देव लिगाडएा । तुका ह्मणे भाडएा दंभें ठकी ॥3॥ 1861 देव बराडी देव बराडी । घाली देंठासाटीं उडी ॥1॥ देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥ देव भाविक भाविक । होय दासाचें सेवक ॥2॥ देव होया देव होया । जैसा ह्मणे तैसा तया ॥3॥ देव लाहान लाहान । तुका ह्मणे अनुरेण॥4॥ 1862 देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला॥1॥ देव उदार उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥ देव बळी देव बळी। जोडा नाहीं भूमंडळीं ॥2॥ देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥3॥ देव चांगला चांगला । तुका चरणीं लागला ॥4॥ 1863 देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥1॥ देव देखिला देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥ देवा कांहीं मागों मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥2॥ देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥3॥ देव कातर कातर । तुका ह्मणे अभ्यंतर ॥4॥ 1864 देव आमचा आमचा । जीव सकळ जीवांचा ॥1॥ देव आहे देव आहे । जवळीं आह्मां अंतरबाहे ॥ध्रु.॥ देव गोड देव गोड । पुरवी कोडाचें ही कोड ॥2॥ देव आह्मां राखे राखे । घाली किळकाळासी काखे ॥3॥ देव दयाळ देव दयाळ । करी तुक्याचा सांभाळ ॥4॥ 1865 जाऊं देवाचिया गांवां । देव देइऩल विसांवा ॥1॥ देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥ घालूं देवासी च भार। देव सुखाचा सागर ॥2॥ राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥3॥ तुका ह्मणे आह्मी बाळें । या देवाचीं लडिवाळें॥4॥ 1866 प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी ॥1॥ प्रेम यावें तया गांवा । चोजवीत या वैष्णवां ॥ध्रु.॥ प्रेमें पाठी लागे बळें। भH देखोनियां भोळे ॥2॥ प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥3॥ तुका ह्मणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां॥4॥ 1867 संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥1॥ तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥ गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥2॥ तुका ह्मणे माया । अवरा हे पंढरिराया ॥3॥ 1868 नाहीं तुह्मी केला । अंगीकार तो विठ्ठला ॥1॥ सोंगें न पवीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥ध्रु.॥ प्रेम नाही अंगीं । भले ह्मणविलें जगीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । मज वांयां कां चाळवा॥3॥ 1869 आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥1॥ तुमचीं ह्मणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥ काळ आह्मां खाय । तरी तुझें नांव जाय ॥2॥ तुका ह्मणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥3॥ 1870 मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥1॥ हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥ धनमंत्री हरी रोग्याचिये वेथे । तें तों कांहीं येथें न देखिजे ॥2॥ तुका ह्मणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥3॥ 1871 काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शिHहीण ॥1॥ माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरिष्ठ तें ॥ध्रु.॥ काय गमाविली सुदर्शन गदा । नो बोला गोविंदा लाजतसां ॥2॥ तुका ह्मणे काय िब्रदाचें तें काम । सांडा परतें नाम दिनानाथ ॥3॥ 1872 बळ बुद्धी वेचुनियां शHी । उदक चालवावें युHी॥1॥ नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं॥ध्रु.॥ पाट मोट कळा । भरित पखाळा सागळा ॥2॥ बीज ज्यासी घ्यावें। तुका ह्मणे तैसें व्हावें ॥3॥ 1873 न ह्मणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥1॥ सकळा द्यावी एकी चवी । तान हरूनि निववी ॥ध्रु.॥ न ह्मणे दिवस राती । सर्व काल सर्वां भूतीं ॥2॥ तुका ह्मणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥3॥ 1874 इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं ॥1॥ उदका नेलें तिकडे जावें । केलें तैसें सहज व्हावें ॥ध्रु.॥ [[मोहरी]] [[कांदा]] ऊंस । एक वाफा भिन्न रस ॥2॥ तुका ह्मणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥3॥ 1875 तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाइऩ अनंता करूनियां ॥1॥ उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुह्मी त्यांसी ॥ध्रु.॥ मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुह्मी तारिला पांडुरंगा ॥2॥ तुका ह्मणे नांवासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥3॥ 1876 कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥1॥ धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी॥ध्रु.॥ आइकोन माझे नाइकसी बोल । देखोनियां खोळ बुंथी घेसी ॥2॥ तुका ह्मणे एके गांवींची वसती । ह्मणऊनि खंती वाटे देवा ॥3॥ 1877 आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥1॥ अझून कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीरीं विष जालें ॥2॥ चुकलों काय तें मज क्षमा करीं । आिंळगूनि हरी प्रेम द्यावें ॥3॥ अवस्था राहिली रूपाची अंतरीं । बाहेर भीतरी सर्व काळ ॥4॥ तुका ह्मणे माजे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आतां ॥5॥ ॥ शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा, कारकून असे न्यावयास पाठविले ते अभंग ॥ 14 ॥ 1878 दिवटएा छत्री घोडे । हें तों ब†यांत न पडे ॥1॥ आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥ध्रु.॥ मान दंभ चेष्टा। हे तों शूकराची विष्ठा ॥2॥ तुका ह्मणे देवा । माझे सोडववणे धांवा ॥3॥ 1879 नावडे जें चित्ता । तें चि होसी पुरविता ॥1॥ कां रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटीं ॥ध्रु.॥ न करावा संग । वाटे दुरावावें जग ॥2॥ सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥3॥ जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥4॥ तुका ह्मणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ॥5॥ 1880 जाणोनि अंतर । टािळसील करकर ॥1॥ तुज लागली हे खोडी । पांडुरंगा बहु कुडी ॥ध्रु.॥ उठविसी दारीं । धरणें एखादिया परी ॥2॥ तुका ह्मणे पाये । कैसे सोडीन ते पाहें ॥3॥ 1881 नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥1॥ नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥ वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥2॥ तुका ह्मणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ॥3॥ 1882 काय दिला ठेवा । आह्मां विठ्ठल चि व्हावा ॥1॥ तुह्मी कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥ध्रु.॥ जीव दिला तरी। वचना माझ्या नये सरी ॥2॥ तुका ह्मणे धन । आह्मां गोमासासमान ॥3॥ 1883 पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥1॥ पुढें उरे खातां देतां । नव्हे खंडण मवितां ॥ध्रु.॥ खोलीं पडे ओली बीज। तरीं च हातीं लागे निज ॥2॥ तुका ह्मणे धनी । विठ्ठल अक्षरी हीं तिन्ही ॥3॥ 1884 मुंगी आणि राव । आह्मां सारखाची जीव ॥1॥ गेला मोह आणि आशा । किळकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥ सोनें आणि माती। आह्मां समान हें चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे आलें । घरा वैकुंठ सगळें ॥3॥ 1885 तिहीं त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी ॥1॥ हातां आले घाव डाव । आमचा मायबाप देव ॥ध्रु.॥ काय त्रिभुवनीं बळ। अंगीं आमुच्या सकळ ॥2॥ तुका ह्मणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥3॥ 1886 आह्मी तेणें सुखी । ह्मणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥1॥ तुमचें येर वित्त धन । तें मज मृित्तकेसमान ॥ध्रु.॥ कंटीं मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥2॥ ह्मणवा हरिचे दास । तुका ह्मणे मज हे आस ॥3॥ ॥9॥ 1887 नाही काष्ठाचा गुमान । गोवी भ्रमरा सुमन ॥1॥ प्रेम प्रीतीचेे बांधलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥ पदरीं घालीं पिळा। बाप निर्बळ साटी बाळा ॥2॥ तुका ह्मणे भावें । भेणें देवा आकारावें ॥3॥ 1888 भावापुढें बळ । नाहीं कोणाचे सबळ ॥1॥ करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥ध्रु.॥ बैसे तेथें येती । न पाचारितां सर्व शिH ॥2॥ तुका ह्मणे राहे । तयाकडे कोण पाहे॥3॥ 1889 भावाचिया बळें । आह्मी निर्भर दुर्बळें ॥1॥ नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ता ॥ध्रु.॥ तकाऩ नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥2॥ एकछत्रीं राज । तुक्या पांडुरंगीं काज॥3॥ 1890 सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥1॥ आYाा वाहोनियां शिरीं । सांगितलें तें चि करीं ॥ध्रु.॥ सरलीसे धांव । न लगे वाढवावी हांव ॥2॥ आहे नाहीं त्याचें । तुका ह्मणे कळे साचें॥3॥ 1891 खावें ल्यावें द्यावें । जमाखर्च तुझ्या नांवें ॥1॥ आतां चुकली खटपट । झाडएा पाडएाचा बोभाट ॥ध्रु.॥ आहे नाहीं त्याचें । आह्मां काम सांगायाचें ॥2॥ तुका ह्मणे चिंता । भार वाहे तुझ्या माथां ॥3॥ 1892 आतां बरें जालें । माझे माथांचें निघालें ॥1॥ चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥ नसतां कांहीं जोडी । करिती बहुतें तडातोडी ॥2॥ जाला झाडापाडा । तुका ह्मणे गेली पीडा ॥3॥ 1893 संचितें चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥1॥ आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥ नाहीं काम हातीं। आराणूक दिसराती ॥2॥ तुका ह्मणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥3॥ 1894 ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास॥1॥ तरी च जोडिलें तें भोगे । कांहीं आघात न लगे ॥ध्रु.॥ वाढवावी थोरी। मुखें ह्मणे तुझे हरी ॥2॥ तुका ह्मणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ॥3॥ 1895 माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥1॥ कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥ लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं पालट अंतरीं । तेथें दिसे हरी ठकाठकी ॥3॥ 1896 तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥1॥ हें तुह्मां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा॥ध्रु.॥ जेवित्याची खूण वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥2॥ तुका ह्मणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हारसंपादणी ॥3॥ 1897 न पालटे एक । भोळा भH चि भाविक ॥1॥ येरां नास आहे पुढें । पुण्य सरतां उघडें ॥ध्रु.॥ नेणे गर्भवास । एक विष्णूचा चि दास ॥2॥ तुका ह्मणे खरें । नाम विठोबाचे बरें ॥3॥ ॥ स्वामींनीं पत्र पंढरीनाथास पंढरीस पाठविलें ते अभंग ॥ 66 ॥ संतांबरोबर पाठविल्या पत्राचे अभंग 36 1898 कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥1॥ मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ध्रु.॥ निरांजिरें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे ॥2॥ तुका ह्मणे कइप भाग्याची उजरी। होइऩल पंढरी देखावया ॥3॥ 1899 कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥1॥ कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥ नाहीं निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥2॥ तुका ह्मणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥3॥ 1900 कांहीं माझे कळों आले गुणदोष । ह्मणऊनि उदास धरिलें ऐसें ॥1॥ नाहीं तरी येथें न घडे अनुचित । नाहीं ऐसी रीत तया घरीं ॥ध्रु.॥ कळावें तें मना आपुलिया सवें । ठायींचे हें घ्यावें विचारूनि ॥2॥ मज अव्हेरिलें देवें । माझिया कर्तव्यें बुद्धीचिया॥3॥ 1901 नव्हे धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥1॥ कोपोनियां तरी देइऩल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि ॥ध्रु.॥ नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥2॥ तुका ह्मणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥3॥ 1902 आतां पाहों पंथ माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखें ॥1॥ काय करूं आतां न गमेसें जालें । बहुत सोसिलें बहु दिस ॥ध्रु.॥ घर लागे पाठी चित्ता उभे वारे । आपुलें तें झुरे पाहावया ॥2॥ तुका ह्मणे जीव गेला तरी जाव । धरिला तो देव भाव सिद्धी ॥3॥ 1903 विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥1॥ धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥ध्रु.॥ जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥2॥ जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबडएा उत्तरीं गौरवितों ॥3॥ तुका ह्मणे विटेवरि जी पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥4॥ 1904 देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥1॥ पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष ॥ध्रु.॥ सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रििद्ध सििद्ध ठायीं मुिHचारी ॥2॥ इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥3॥ तुका ह्मणे जड जीव शिHहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥4॥ 1905 काय जालें नेणों माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां ॥1॥ बहु दिस पाहें वचनासी वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ध्रु.॥ नाहीं निरोपाचें पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठ‍ न पाहिजे ॥2॥ पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरूरसा ॥3॥ तुका ह्मणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥4॥ 1906 एवढा संकोच तरि कां व्यालासी । आह्मी कोणांपाशीं तोंड वासूं ॥1॥ कोण मज पुसे सिणलें भागलें । जरी मोकलिलें तुह्मीं देवा ॥ध्रु.॥ कवणाची वाट पाहों कोणीकडे । कोण मज ओढे जीवलग ॥2॥ कोण जाणे माझे जीवींचें सांकडें । उगवील कोडें संकटाचें॥3॥ तुका ह्मणे तुह्मी देखिली नििंश्चती । काय माझे चित्तीं पांडुरंगा ॥4॥ 1907 देइप डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥1॥ तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहनिऩशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥ फार थोडें काहीं करूनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥2॥ आहे माझी ते चि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥3॥ तुका ह्मणे आह्मां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥4॥ 1908 सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥1॥ इंिद्रयांची धांव होइऩल कुंटित । पावेल हें चित्त समाधान॥ध्रु.॥ माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥2॥ आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटे आपणासी ॥3॥ तुका ह्मणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥4॥ 1909 धरितों वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥1॥ तळमळी चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥ध्रु.॥ प्रकार ते कांहीं नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥2॥ जातों तळा येतों मागुता लौकरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥3॥ तुका ह्मणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥4॥ 1910 कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥1॥ पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ध्रु.॥ कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पवती ॥2॥ कां या इंिद्रयांची न पुरे वासना । पवित्र होइऩना जिव्हा कीर्ती ॥3॥ तुका ह्मणे कइप जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥4॥ 1911 काय पोरें जालीं फार । किंवा न साहे करकर ॥1॥ ह्मणऊनि केली सांडी । घांस घेऊं न ल्हां तोंडीं ॥ध्रु.॥ करूं कलागती। तुज भांडणें भोंवतीं ॥2॥ तुका ह्मणे टांचें । घरीं जालेंसे वरोचें ॥3॥ 1912 कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥1॥ तरी हा पडिला विसर । माझा तुह्मां जाला भार ॥ध्रु.॥ आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां गांठी ॥2॥ तुका ह्मणे घरीं । बहु बैसले रिणकरी॥3॥ 1913 निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥1॥ परी हें नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥ध्रु.॥ सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥2॥ न लगे निरोपासी मोल । तुका ह्मणे वेचे बोल ॥3॥ 1914 जोडीच्या हव्यासें । लागे धनांचें चि पिसें ॥1॥ मग आणीक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥ध्रु.॥ पाहे रुक्याकडे । मग अवघें ओस पडे ॥2॥ तुका ह्मणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥3॥ 1915 मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती ॥1॥ परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥ध्रु.॥ अवघ्यां अवघा काळ । वाटा पाहाती सकळ ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥3॥ 1916 न बैससी खालीं । सम उभा च पाउलीं ॥1॥ ऐसे जाले बहुत दिस । जालीं युगें अठ्ठाविस ॥ध्रु.॥ नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥2॥ तुका ह्मणे किती । मापें केलीं देती घेती॥3॥ 1917 जोडी कोणांसाटीं । एवढी करितोसी आटी ॥1॥ जरी हें आह्मां नाहीं सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥ध्रु.॥ करूनि जतन। कोणा देसील हें धन ॥2॥ आमचे तळमळे । तुझें होइऩल वाटोळें ॥3॥ घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥4॥ तुका ह्मणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥5॥ 1918 करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥1॥ जरि तूं होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥ध्रु.॥ येथें न करी काम। मुखें नेघें तुझें नाम ॥2॥ तुका ह्मणे कुळ । तुझें बुडवीन समूळ॥3॥ 1919 समर्थाचे पोटीं । आह्मी जन्मलों करंटीं ॥1॥ ऐसी जाली जगीं कीतिऩ । तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥ येथें नाहीं खाया। न ये कोणी मूळ न्याया ॥2॥ तुका ह्मणे जिणें । आतां खोटें जीवपणें ॥3॥ 1920 पुढें तरी चित्ता । काय येइऩल तें आतां ॥1॥ मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥ कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥2॥ तुका ह्मणे चिंता । बहु वाटतसे आतां॥3॥ 1921 कैंचा मज धीर । कोठें बुिद्ध माझी िस्थर ॥1॥ जें या मनासी आवरूं । आंत पोटीं वाव धरूं ॥ध्रु.॥ कैंची शुद्ध मति। भांडवल ऐसें हातीं ॥2॥ तुका ह्मणे कोण दशा आली सांगा ॥3॥ 1922 समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥1॥ आतां भावें करूनि साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ध्रु.॥ न कळे उचित। करूं समाधान चित्त ॥2॥ तुका ह्मणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥3॥ 1923 येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥1॥ घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥ पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें ॥2॥ तुका ह्मणे येती । जाइन सामोरा पुढती ॥3॥ 1924 रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥1॥ तैसें माझें दंडवत । सांगा निरोप हा संत ॥ध्रु.॥ पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥2॥ तुका ह्मणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ॥3॥ 1925 तुह्मी संतजनीं । माझी करावी विनवणी ॥1॥ काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥ध्रु.॥ भाका बहुतां रीती। माझी कीव काकुलती ॥2॥ न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी॥3॥ 1926 होइल कृपादान । तरी मी येइऩन धांवोन ॥1॥ होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ध्रु.॥ रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥2॥ तुका ह्मणे ताप । हरती देखोनियां बाप॥3॥ 1927 परिसोनि उत्तर । जाब देइऩजे सत्वर ॥1॥ जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥ नाणीं कांहीं मना । करूनि पापाचा उगाणा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । काय शिH तुझे पायीं ॥3॥ 1928 ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥1॥ माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥ध्रु.॥ बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥2॥ तुका ह्मणे धांवे । वासना ते रस घ्यावे॥3॥ 1929 किती करूं शोक । पुढें वाढे दुःखें दुःख ॥1॥ आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं धरी ॥ध्रु.॥ पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥2॥ तुका ह्मणे बळ । माझी राहिली तळमळ ॥3॥ 1930 करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥1॥ जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥ध्रु.॥ घरीं लागे कळहे। नाहीं जात तो शीतळ ॥2॥ तुका ह्मणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥3॥ 1931 आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥1॥ ह्मणसी कोणा तरी काळें । आहेतसी माझीं बाळें ॥ध्रु.॥ दुरी दूरांतर। तरी घेसी समाचार ॥2॥ नेसी कधीं तरी । तुका ह्मणे लाज हरी ॥3॥ 1932 आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥1॥ आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु.॥ आतां करकर। पुढें न करीं उत्तर ॥2॥ तुका ह्मणे ठसा । तुझा आहे राखें तैसा ॥3॥ 1933 बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥1॥ क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥ स्तुती निंदा केली। लागे पाहिजे साहिली ॥2॥ तुका ह्मणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥3॥ ॥36॥ या पत्राच्या उत्तराच्या मार्गप्रतीक्षेचे अभंग 19 1934 माहेरिंचा काय येइऩल निरोप । ह्मणऊनि झोंप नाहीं डोळां ॥1॥ वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥ बोटवरी माप लेखितों दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥2॥ काय नेणों संतां पडेल विसर । कीं नव्हे सादर मायबाप॥3॥ तुका ह्मणे तेथें होइऩल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥4॥ 1935 परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी॥1॥ बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे॥ध्रु.॥ सांगितल्याविणें जाणे अंतरिंचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥2॥ बहुमुखें कीर्ती आइकिली कानीं । विश्वास ही मनीं आहे माझा ॥3॥ तुका ह्मणे नाहीं जात वांयांविण । पािळतो वचन बोलिलों तें ॥4॥ 1936 यावरि न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होइल पुढें ॥1॥ करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥ जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हें भरोवरी करी चित्त ॥2॥ आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचे ही वेग वावडती॥3॥ तुका ह्मणे तेव्हां होतील निश्चळ । इंिद्रयें सकळ निरोपानें ॥4॥ 1937 होइऩल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां॥1॥ करूनियां दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्तें॥ध्रु.॥ होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥2॥ येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधान होतीं संतीं ॥3॥ तुका ह्मणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परपरतों ॥4॥ 1938 ऐसी ते सांडिली होइऩल पंढरी । येते वारकरी होत वाटे ॥1॥ देखिले सोहळे होती आठवत । चालती ते मात करूनियां ॥ध्रु.॥ केली आइकिली होइऩल जे कथा । राहिलें तें चित्ता होइल प्रेम ॥2॥ गरुडटके टाळ मृदांग पताका । सांगती ते एकां एक सुख ॥3॥ तुका ह्मणे आतां येती लवलाहीं । आलिंगूनि बाहीं देइन क्षेम ॥4॥ 1939 क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥1॥ न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥ अंतरींचें संत जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील॥2॥ पायांवरी डोइऩ ठेवीन आदरें । प्रीतिपडिभरें आिंळगून ॥3॥ तुका ह्मणे काया करीन कुरवंडी । ओवाळून सांडीं त्यांवरून ॥4॥ 1940 होइल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥1॥ शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥ध्रु.॥ क्षेम आहे ऐसें होइल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ ॥2॥ अवस्था जे माझी ठावी आहे संतां । होइल कृपावंता निरोपिली ॥3॥ तुका ह्मणे सवें येइऩल मु†हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥4॥ 1941 दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥1॥ करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥ध्रु.॥ लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥2॥ अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥3॥ व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका ह्मणे मना मन साक्ष ॥4॥ 1942 बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोइऩ ॥1॥ घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी॥ध्रु.॥ नो बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥2॥ इंिद्रयांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली ये चि ठायीं॥3॥ एकसरें सोस माहेरासी जावें । तुका ह्मणे जीवें घेतलासे ॥4॥ 1943 नाहीं हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करूं ॥1॥ पुसाविसी वाटे मात कापडियां । पाठविती न्याया मूळ मज ॥ध्रु.॥ आणीक या मना नावडे सोहळा । करितें टकळा माहेरींचा ॥2॥ बहु कामें केलें बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाहीं ॥3॥ तुका ह्मणे त्याचें न कळे अंतर । अवस्था तों फार होते मज ॥4॥ 1944 तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥1॥ कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ध्रु.॥ दिसे हानि परी निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव॥2॥ आपुलिया भोगें होइऩल उशीर । तोंवरी कां धीर केला नाहीं ॥3॥ तुका ह्मणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायीं आहे ॥4॥ 1945 माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥1॥ पायांवरी माथा आिंळगीन बाहीं । घेइऩन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥ सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥2॥ आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन अघवें आहे तैसें ॥3॥ तुका ह्मणे वीट नेघें आवडीचा । बोलिली च वाचा बोलवीन ॥4॥ 1946 वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥1॥ विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ध्रु.॥ कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें॥2॥ निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥3॥ तुका ह्मणे हित चित्तें ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥4॥ 1947 आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागली ते ॥1॥ सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु.॥ काय लाभ जाला काय होतें केणें । काय काय कोणे सांटविलें ॥2॥ मागणें तें काय धाडिलें भातुकें । पुसेन तें सुखें आहेतसीं ॥3॥ तुका ह्मणे काय सांगती ते कानीं । ऐकोनियां मनीं धरुनि राहें ॥4॥ 1948 काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥1॥ काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी ॥ध्रु.॥ काय म्यां तेथींचें रांधिलें चाखोनि । तें हें करीं मनीं विवंचना ॥2॥ आणीक ही त्यासी बहुत कारण । बहु असे जिणें ओढीचें ही ॥3॥ तुका ह्मणे आह्मां बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥4॥ 1949 आह्मां अराणूक संवसारा हातीं । पडिली नव्हती आजिवरी ॥1॥ पुत्रदाराधन होता मनी धंदा । गोवियेलों सदा होतों कामें ॥ध्रु.॥ वोडवलें ऐसें दिसतें कपाळ । राहिलें सकळ आवरोनि॥2॥ मागें पुढें कांहीं न दिसे पाहातां । तेथूनियां चिंता उपजली ॥3॥ तुका ह्मणे वाट पाह्याचें कारण । येथीचिया हिंणें जालें भाग्य ॥4॥ 1950 बहु दिस नाहीं माहेरिंची भेटी । जाली होती तुटी व्यवसायें ॥1॥ आपुल्याला होतों गुंतलों व्यासंगें । नाहीं त्या प्रसंगें आठवलें ॥ध्रु.॥ तुटातें तुटतें जडती जडलें । आहे तें आपुलें आपणापें ॥2॥ बहु निरोपाचें पावलें उत्तर । जवळी च पर एक तें ही ॥3॥ काय जाणों मोह होइऩल सांडिला । बहु दिस तुटला तुका ह्मणे ॥4॥ 1951 होतीं नेणों जालीं कठिणें कठीण । जवळी च मन मनें ग्वाही ॥1॥ आह्मी होतों सोइऩ सांडिला मारग । घडिलें तें मग तिकून ही ॥ध्रु.॥ नििंश्चतीनें होते पुढिलांची सांडी । न चाले ते कोंडी मायबापा ॥2॥ आह्मां नाहीं त्यांचा घडिला आठव । त्यांचा बहु जीव विखुरला ॥3॥ तुका ह्मणे जालें धर्माचें माहेर । पडिलें अंतर आह्मांकूनि ॥4॥ 1952 आतां करावा कां सोंस वांयांविण । लटिका चि सीण मनासी हा ॥1॥ असेल तें कळों येइऩल लौकरी । आतां वारकरी आल्यापाठी ॥ध्रु.॥ बहु विलंबाचें सन्निध पातलें । धीराचें राहिलें फळ पोटीं ॥2॥ चालिलें तें ठाव पावेल सेवटीं । पुरलिया तुटी पाउलांची ॥3॥ तुका ह्मणे आसे लागलासे जीव । ह्मणऊनि कींव भाकीतसें ॥4॥ ॥19॥ व संत परत आले त्यांची भेट झाली ते अभंग 11 1953 भागलेती देवा । माझा नमस्कार घ्यावा ॥1॥ तुह्मी क्षेम कीं सकळ । बाळ अवघे गोपाळ ॥ध्रु.॥ मारगीं चालतां । श्रमलेती येतां जातां ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । कृपा आहे माझ्या ठायीं ॥3॥ 1954 घालूनियां ज्योती । वाट पाहें दिवसराती ॥1॥ बहु उताविळ मन । तुमचें व्हावें दरुषण ॥ध्रु.॥ आलों बोळवीत । तैसें या चि पंथें चित्त ॥2॥ तुका ह्मणे पेणी । येतां जातां दिवस गणीं॥3॥ 1955 आजि दिवस धन्य । तुमचें जालें दरुषण ॥1॥ सांगा माहेरींची मात । अवघा विस्तारीं वृत्तांत ॥ध्रु.॥ आइकतों मन। करूनि सादर श्रवण ॥2॥ तुका ह्मणे नाम । माझा सकळ संभ्रम ॥3॥ 1956 बोलिलीं तीं काय । माझा बाप आणि माय ॥1॥ ऐसें सांगा जी झडकरी । तुह्मी सखे वारकरी ॥ध्रु.॥ पत्राचें वचन । काय दिलें फिरावून ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । मना आणिलें कीं नाहीं ॥3॥ 1957 काय पाठविलें । सांगा भातुकें विठ्ठलें ॥1॥ आसे लागलासे जीव । काय केली माझी कींव ॥ध्रु.॥ फेडिलें मुडतर । किंवा कांहीं जरजर ॥2॥ तुका ह्मणे सांगा । कैसें आर्त पांडुरंगा॥3॥ 1958 आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें । सुखी जालें मन कल्पवेना ॥1॥ आर्तभूत माझा जीव जयांसाटीं । त्यांच्या जाल्या भेटी पायांसवें ॥ध्रु.॥ वाटुली पाहातां सिणले नयन । बहु होतें मन आर्तभूत ॥2॥ माझ्या निरोपाचें आणिलें उत्तर । होइल समाचार सांगती तो ॥3॥ तुका ह्मणे भेटी निवारला ताप । फळलें संकल्प संत आले ॥4॥ 1959 आजि बरवें जालें । माझें माहेर भेटलें ॥1॥ डोळां देखिले सज्जन । निवारला भाग सीण ॥ध्रु.॥ धन्य जालों आतां । क्षेम देऊनियां संतां ॥2॥ इच्छेचें पावलों । तुका ह्मणे धन्य जालों॥3॥ 1960 वोरसोनि येती । वत्सें धेनुवेच्या चित्तीं ॥1॥ माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥ध्रु.॥ स्नेहें भूक तान । विसरती जाले सीण ॥2॥ तुका ह्मणे कौतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें॥3॥ 1961 आलें तें आधीं खाइऩन भातुकें । मग कवतुकें गाइऩन ओव्या ॥1॥ सांगितला आधीं आइकों निरोप । होइल माझा बाप पुसें तों तें ॥2॥ तुका ह्मणे माझे सखे वारकरी । आले हे माहेरीहून आजि ॥3॥ 1962 आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥1॥ काय सांगों सुख जालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥2॥ तुका ह्मणे यांच्या उपकारासाटीं । नाहीं माझे गांठी कांहीं एक ॥3॥ 1963 पवित्र व्हावया घालीन लोळणी । ठेवीन चरणीं मस्तक हें ॥1॥ जोडोनि हस्तक करीन विनवणी । घेइन पायवणी धोवोनियां ॥2॥ तुका ह्मणे माझें भांडवल सुचें । संतां हें ठायींचें ठावें आहे ॥3॥ ॥11॥ पत्राचे अभंग समाप्त । 36 । 19 । 11 ॥ 66॥ 1964 मना एक करीं । ह्मणे जाइऩन पंढरी । उभा विटेवरी। तो पाहेन सांवळा ॥1॥ करीन सांगती तें काम । जरी जपसी हें नाम । नित्य वाचे राम । हरि कृष्ण गोविंदा ॥ध्रु.॥ लागें संतांचिया पायां । कथे उल्हास गावया । आलों मागावया । शरण देइप उचित॥2॥ नाचें रंगीं वाहें टाळी । होय सादर ते काळीं । तुका ह्मणे मळी । सांडूनियां अंतरी ॥3॥ 1965 न राहे क्षण एक वैकुंठीं । क्षीरसागरीं त्रिपुटी । जाय तेथें दाटी । वैष्णवांची धांवोनि ॥1॥ भाविक गे माये भोळें गुणाचें। आवडे तयाचें नाम घेतां तयासी ॥ध्रु.॥ जो नातुडे कवणिये परी । तपें दानें व्रतें थोरी । ह्मणतां वाचे हरि । राम कृष्ण गोविंदा ॥2॥ चौदा भुवनें जया पोटीं । तो राहे भHांचिये कंठीं । करूनियां साटी। चित्त प्रेम दोहींची ॥3॥ जया रूप ना आकार । धरी नाना अवतार । घेतलीं हजार । नांवें ठेवूनि आपणां ॥4॥ ऐसा भHांचा ॠणी । पाहातां आगमीं पुराणीं । नाहीं तुका ह्मणे ध्यानीं । तो कीर्तनीं नाचतसे ॥5॥ 1966 स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥1॥ तुह्मी आह्मी खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥ ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥2॥ तुका ह्मणे हें चि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥3॥ 1967 आनंदाच्या कोटी । सांटवल्या आह्मां पोटीं ॥1॥ प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो ॥ध्रु.॥ अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥2॥ थडी आहिक्य परत्र । तुका ह्मणे सम तीर ॥3॥ 1968 चाहाडाची माता । व्यभिचारीण तkवता ॥1॥ पाहे संतांचें उणें । छिद्र छळावया सुनें ॥ध्रु.॥ जेणों त्याच्या वाचें । कांहीं सोडिलें गाठीचें ॥2॥ तुका ह्मणे घात । व्हावा ऐसी जोडी मात ॥3॥ 1969 सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥1॥ काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥ विंचु हाणें नांगी। अग्न लावी आणिकां अंगीं ॥2॥ तुका ह्मणे जाती । नरका पाउलीं चालती ॥3॥ ॥6॥ स्वामींनीं स्त्रीस उपदेश केला ते अभंग ॥ 11 ॥ 1970 पिकल्या सेताचा आह्मां देतो वांटा । चौधरी गोमटा पांडुरंग ॥1॥ सत्तर टके बाकी उरली मागे तो हा । मागें झडले दाहा आजिवरी ॥ध्रु.॥ हांडा भांडीं गुरें दाखवी ऐवज । माजघरीं बाजे बैसलासे ॥2॥ मज यासी भांडतां जाब नेदी बळें । ह्मणे एका वेळे घ्याल वांटा ॥3॥ तुका ह्मणे िस्त्रये काय वो करावें । नेदितां लपावें काय कोठें ॥4॥ 1971 करितां विचार अवघें एक राज्य । दुजा कोण मज पाठी घाली ॥1॥ कोण्या रीती जावें आह्मी वो पळोनि । मोकळ अंगणीं मागें पुढें ॥ध्रु.॥ काय तें गव्हाणें हिंडावीं वो किती । दूत ते लागती याच पाठी ॥2॥ कोठें याची करूं केलों कुळवाडी । आतां हा न सोडी जीवें आह्मां ॥3॥ होऊनि बेबाख येथें चि राहावें। देइऩल तें खावें तुका ह्मणे ॥4॥ 1972 नागवूनि एकें नागवीं च केली । फिरोनियां आलीं नाहीं येथें ॥1॥ भेणें सुती कोणी न घेती पालवीं । करूनियां गोवी निसंतान ॥ध्रु.॥ एकें तीं गोविलीं घेऊनि जमान । हांसतील जन लोक तयां ॥2॥ सरले तयांसी घाली वैकुंठीं । न सोडी हे साटी जीवें जाली ॥3॥ तुका ह्मणे जालों जाणोनि नेणती । सांपडलों हातीं याचे आह्मी ॥4॥ 1973 आतां तूं तयास होइऩ वो उदास । आरंभला नास माझ्या जीवा ॥1॥ जरूर हें जालें मज कां नावडे । उपास रोकडे येती आतां ॥ध्रु.॥ बरें म्या तुझिया जीवाचें तें काय । व्हावें हें तें पाहें विचारूनि ॥2॥ तुज मज तुटी नव्हे या विचारें । सहित लेकुरें राहों सुखें ॥3॥ तुका ह्मणे तरी तुझा माझा संग । घडेल वियोग कधीं नव्हे ॥4॥ 1974 काय करूं आतां माझिया संचिता । तेणें जीववित्ता साटी केली ॥1॥ न ह्मणावें कोणी माझें हें करणें । हुकुम तो येणें देवें केला ॥ध्रु.॥ करूनि मोकळा सोडिलों भिकारी । पुरविली तरी पाठी माझी ॥2॥ पाणिया भोंपळा जेवावया पानें । लाविलीं वो येणें देवें आह्मां ॥3॥ तुका ह्मणे यासी नाहीं वो करुणा । आहे नागवणा ठावा मज ॥4॥ 1975 नको धरूं आस व्हावें या बाळांस । निर्माण तें त्यांस त्यांचें आहे ॥1॥ आपुला तूं गळा घेइप उगवूनि । चुकवीं जाचणी गर्भवास ॥ध्रु.॥ अवेज देखोनि बांधितील गळा । ह्मणोनि निराळा पळतुसें ॥2॥ देखोनियां त्यांचा अवघड मार । कांपे थरथर जीव माझा ॥3॥ तुका ह्मणे जरी आहे माझी चाड । तरी करीं वाड चित्त आतां ॥4॥ 1976 भले लोक तुज बहु मानवती । वाढेल या कीतिऩ जगामाजी ॥1॥ ह्मणे मेलीं गुरें भांडीं नेलीं चोरें । नाहींत लेंकुरें जालीं मज ॥ध्रु.॥ आस निरसूनि कठिण हें मन । करीं वो समान वज्र तैसें ॥2॥ किंचित हें सुख टाकीं वो थुंकोनि । पावसील धनी परमानंद ॥3॥ तुका ह्मणे थोर चुकती सायास । भवबंद पाश तुटोनियां ॥4॥ 1977 ऐक हें सुख होइऩल दोघांसी । सोहळा हे ॠषि करिती देव ॥1॥ जडितविमानें बैसविती मानें । गंधर्वांचें गाणें नामघोष ॥ध्रु.॥ संत महंत सिद्ध येतील सामोरे । सर्वसुखा पुरे कोड तेथें ॥2॥ आलिंगूनि लोळों त्यांच्या पायांवरी । जाऊं तेथवरी मायबापें ॥3॥ तुका ह्मणे तया सुखा वणूप काय । जेव्हां बापमाय देखें डोळां ॥4॥ 1978 देव पाहावया करीं वो सायास । न धरीं हे आस नाशिवंत ॥1॥ दिन शुद्ध सोम सकाळीं पातला । द्वादशी घडला पर्वकाळ ॥ध्रु.॥ द्विजां पाचारूनि शुद्ध करीं मन । देइप वो हें दान यथाविध ॥2॥ नको चिंता करूं वस्त्रा या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥3॥ तुका ह्मणे दुरी सांगतों पाल्हाळीं । परी तो जवळी आहे आह्मां ॥4॥ 1979 सुख हें नावडे आह्मां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥1॥ भूक तान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥ द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आह्मांसी पाषाणाहूनि हीन ॥2॥ सोइरे सज्जन जन आणि वन । अवघें समान काय गुणें ॥3॥ तुका ह्मणे आह्मां जवळी च आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥4॥ 1980 गुरुकृपे मज बोलविलें देवें । होइऩल हें घ्यावें हित कांहीं ॥1॥ सत्य देवें माझा केला अंगीकार । आणीक विचार नाहीं आतां ॥ध्रु.॥ होइऩ बळकट घालूनियां कास । हा चि उपदेश तुज आतां ॥2॥ सडा संमार्जन तुळसीवृंदावन । अतीतपूजन ब्राह्मणाचें॥3॥ वैष्णवांची दासी होइप सर्वभावें । मुखीं नाम घ्यावें विठोबाचें ॥4॥ पूर्णबोध स्त्रीभ्रतारसंवाद । धन्य जिहीं वाद आइकिला॥5॥ तुका ह्मणे आहे पांडुरंगकथा । तरेल जो चित्ता धरील कोणी ॥6॥ ॥11॥ 1981 खडा रवाळी साकर । जाला नामाचा चि फेर । न दिसे अंतर । गोडी ठायीं निवडितां ॥1॥ तुह्मी आह्मी पांडुरंगा । भिन्न ऐसें काय सांगा । जाळविलें जगा । मी हें माझें यासाटीं॥ध्रु॥ पायीं हातीं नाकीं शिरीं । हेम राहे अळंकारीं । मुसे आल्यावरी। काय निवडे वेगळें ॥2॥ निजलिया लाभ हानी । तों च खरी ते स्वप्नीं । तुका ह्मणे दोन्ही । निवारलीं जागतां ॥3॥ 1982 आह्मी जाणों तुझा भाव । कैंचा भH कैंचा देव । बीजा नाहीं ठाव । कैंचें फळ शेवटीं ॥1॥ संपादिलें बहु रूप । कैंचें पुण्य कैंचें पाप । नव्हतों आह्मी आप । आपणासी देखिलें॥ध्रु.॥ एके ठायीं घरिच्याघरीं । न कळतां जाली चोरी । तेथें तें चि दुरी । जाणें येणें खुंटलें ॥2॥ तुका ह्मणे धरूनि हातीं । उर ठेविली मागुती । एकांतीं लोकांतीं । देवभिHसोहळा ॥3॥ 1983 कांहीं बोलिलों बोबडें । मायबापा तुह्मांपुढें । सलगी लाडें कोडें । मज क्षमा करावी ॥1॥ काय जाणावा महिमा । तुमचा म्यां पुरुषोत्तमा । आवडीनें सीमा । सांडविली मज हातीं ॥ध्रु.॥ घडे अवYाा सख्यत्वें । बाळें बापासी न भ्यावें । काय म्यां सांगावें । आहे ठावें तुह्मासी ॥2॥ तुका ह्मणे देवा । प्रेम लोभ न संडावा । पािळला पाळावा । लळा पुढती आगळा ॥3॥ 1984 बहु भितों जाणपणा । आड न यो नारायणा । घेइन प्रेमपान्हा । भिHसुख निवाडें ॥1॥ यासी तुळे ऐसे कांहीं । दुजें त्रिभुवनीं नाहीं । काला भात [[दही]]ं । ब्रह्मादिकां दुर्लभ ॥ध्रु.॥ निमिशा अर्ध संतसंगति । वास वैकुंठीं कल्पांतीं । मोक्षपदें होती । ते विश्रांति बापुडी ॥2॥ तुका ह्मणे हें चि देइप । मीतूंपणा खंड नाहीं। बोलिलों त्या नाहीं । अभेदाची आवडी ॥3॥ ॥4॥ 1985 देवा आतां ऐसा करीं उपकार । देहेचा विसर पाडीं मज ॥1॥ तरीं च हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें ॥ध्रु.॥ ठाव देइप चित्ता राख पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित ॥2॥ असे भय आतां लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा ॥3॥ मागणें तें एक हें चि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देइप ॥4॥ तुका ह्मणे नको वरपंग देवा । घेइप माझी सेवा भावशुद्ध ॥5॥ 1986 तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥1॥ घेइप माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥ उचित अनुचित पापपुण्यकाला । हा तों नये मला निवडितां ॥2॥ कुंटित राहिली बोलतां बोलतां । पार न पवतां वाणी पुढें ॥3॥ पुसतां ही कोणां न कळे हें गुज । राखें आतां लाज पांडुरंगा ॥4॥ तुका ह्मणे बहु पाहिलें या जीवें । वर्म जालें जी ठावें नाम तुझें ॥5॥ 1987 मज त्याची भीड नुलंघवे देवा । जो ह्मणे केशवा दास तुझा ॥1॥ मज आवडती बहु तैसे जन । करिती कीर्तन कथा तुझी ॥ध्रु.॥ सांडूनियां लाज नाचेन त्यांपुढें । आइकती कोडें नाम तुझें ॥2॥ न लगे उपचार होइऩन भिकारी । वैष्णवांच्या घरीं उष्टावळी॥3॥ तुका ह्मणे जाणों उचित अनुचित । विचारूनि हित तें चि करूं ॥4॥ 1988 तुझे पाय माझे राहियेले चित्तीं । ते मज दाविती वर्म देवा ॥1॥ आह्मां अंधां तुझ्या पायांचा आधार । जाणसी विचार चाळवितां ॥ध्रु.॥ मन िस्थर ठेलें इंिद्रयें निश्चळ । हें तों माझें बळ नव्हे देवा ॥2॥ पापपुण्य भेद नासिलें तिमिर । त्रिगुण शरीर सांडियेलें ॥3॥ तुका ह्मणे तुझा प्रताप हा खरा । मी जाणें दातारा शरणागत ॥4॥ 1989 जेथें जातों तेथें तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरूनियां ॥1॥ चालों वाटे आह्मी तुझा चि आधार । चालविसी भार सवें माझा ॥ध्रु.॥ बोलों जातां बरळ करिसी तें नीट । नेली लाज धीट केलों देवा ॥2॥ अवघें जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ॥3॥ तुका ह्मणे आतां खेळतों कौतुकें । जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥4॥ 1990 जालें पीक आह्मां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥1॥ जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥ अवघा जाला आह्मां एक पांडुरंग । आतां नाहीं जग माझें तुझें ॥2॥ अवघे चि आह्मी ल्यालों अळंकार । शोभलों हि फार अवघ्यांवरी ॥3॥ तुका ह्मणे आह्मी सदेवांचे दास। करणें न लगे आस आणिकांची ॥4॥ ॥6॥ 1991 साधनें आमुचीं आYोचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥1॥ प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या ॥ध्रु.॥ सांगणें तें तें नाहीं करणें आपण । मोलही वचन बाध जालें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां भांडवल हातीं । येरझारा खाती केवढियें ॥3॥ 1992 शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥1॥ हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥ सुख दुःखाहूनि नाहीं विपरीत । देतील आघात हितफळें ॥2॥ तुका ह्मणे आतां आह्मांसी हें भलें । अवघे चि जाले जीव जंत ॥3॥ 1993 पाप पुण्य दोन्ही वाहाती मारग । स्वर्गनर्कभोग यांचीं पेणीं ॥1॥ एका आड एक न लगे पुसावें । जेविल्या देखावें मागें भूक ॥ध्रु.॥ राहाटीं पडिलें भरोनियां रितीं । होतील मागुतीं येतीं जातीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मी खेळतियांमधीं । नाहीं केली बुद्धी िस्थर पाहों ॥3॥ ॥3॥ 1994 हित तें हें एक राम कंठीं राहे । नाठविती देहभाव देही ॥1॥ हा चि एक धर्म निज बीजवर्म । हें चि जाळी कर्में केलीं महा ॥ध्रु.॥ चित्त राहे पायीं रूप बैसे डोळां । जीवें कळवळा आवडीचा ॥2॥ अखंड न खंडे अभंग न भंगे । तुका ह्मणे गंगे मिळणी सिंधु ॥3॥ ॥1॥ 1995 माझिये जातीचें मज भेटो कोणी । आवडीची धणी फेडावया ॥1॥ आवडे ज्या हरि अंतरापासूनि । ऐसियाचे मनीं आर्त माझें ॥ध्रु.॥ तयालागीं जीव होतो कासावीस । पाहातील वास नयन हे ॥2॥ सुफळ हा जन्म होइऩल तेथून । देतां आलिंगन वैष्णवांसी ॥3॥ तुका ह्मणे तो चि सुदिन सोहळा । गाऊं या गोपाळा धणीवरि ॥4॥ 1996 आमुचें जीवन हें कथाअमृत । आणिक ही संतसमागम॥1॥ सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसें गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥ धालिया ढेंकर येती आनंदाचे । वोसंडलें वाचे प्रेमसुख ॥2॥ पिकलें स्वरूप आलिया घुमरि । रासी ते अंबरीं न समाये ॥3॥ मोजितां तयाचा अंत नाहीं पार । खुंटला व्यापार तुका ह्मणे ॥4॥ 1997 जोडिलें तें आतां न सरे सारितां । जीव बळी देतां हाता आलें ॥1॥ संचित सारूनि बांधिलें धरणें । तुंबिलें जीवन आक्षय हें ॥ध्रु.॥ शीत उष्ण तेथें सुखदुःख नाहीं । अंतर सबाही एक जालें ॥2॥ बीज तो अंकुर पत्र शाखा फळें । प्राप्तबीज मुळें अवघें नासे ॥3॥ तुका ह्मणे नामीं राहिलीसे गोडी । बीजाच्या परवडी होती जाती ॥4॥ 1998 भिHभाव आह्मी बांधिलासे गांठी । साधावितों हाटीं घ्या रे कोणी ॥1॥ सुखाचिया पेंठे घातला दुकान । मांडियेले वान रामनाम ॥ध्रु.॥ सुखाचें फुकाचें सकळांचें सार । तरावया पार भवसिंधु ॥2॥ मागें भाग्यवंत जाले थोर थोर । तिहीं केला फार हा चि सांटा ॥3॥ खोटें कुडें तेथें नाहीं घातपात । तुका ह्मणे चित्त शुद्ध करीं ॥4॥ 1999 प्रजन्यें पडावें आपुल्या स्वभावें । आपुलाल्या दैवें पिके भूमि ॥1॥ बीज तें चि फळ येइऩल शेवटीं । लाभहानितुटी ज्याची तया ॥ध्रु.॥ दीपाचिये अंगीं नाहीं दुजाभाव । धणी चोर साव सारिखे चि ॥2॥ काउळें ढोंपरा ककर तिित्तरा । राजहंसा चारा मुHाफळें ॥3॥ तुका ह्मणे येथें आवडी कारण । पिकला नारायण जयां तैसा ॥4॥ 2000 धीर तो कारण एकविधभाव । पतिव्रते नाहो सर्वभावें॥1॥ चातक हे जळ न पाहाती दृष्टी । वाट पाहे कंठीं प्राण मेघा ॥ध्रु.॥ सूर्यविकाशनी नेघे चंद्रामृत । वाट पाहे अस्तउदयाची॥2॥ धेनु येऊं नेदी जवळी आणिकां । आपुल्या बाळकाविण वत्सा ॥3॥ तुका ह्मणे नेम प्राणांसवेंसाटी । तरी च या गोष्टी विठोबाची ॥4॥ ॥6॥ 2001 रामें स्नानसंध्या केलें क्रियाकर्म । त्याचा भवश्रम निवारला ॥1॥ आणिकें दुरावलीं करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण॥ध्रु.॥ रामनामीं जिंहीं धरिला विश्वास । तिंहीं भवपाश तोडियेले ॥2॥ तुका ह्मणे केलें किळकाळ ठेंगणें । नामसंकीर्तनें भाविकांनीं ॥3॥ 2002 वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥1॥ ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धामिऩक पुण्यशील ॥ध्रु.॥ आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥2॥ तुका ह्मणे मुगुटमणी हे भिH । आणीक विश्रांति अरतिया ॥3॥ 2003 बोलिलों जैसें बोलविलें देवें । माझें तुम्हां ठावें जातिकुळ ॥1॥ करा क्षमा कांहीं नका धरूं कोप । संत मायबाप दीनावरि ॥ध्रु.॥ वाचेचा चाळक जाला दावी वर्म । उचित ते धर्म मजपुढें ॥2॥ तुका ह्मणे घडे अपराध नेणतां । द्यावा मज आतां ठाव पायीं ॥3॥ 2004 संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥1॥ चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥ उिच्छष्ट हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥2॥ तुका ह्मणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥3॥ ॥4॥ 2005 एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥1॥ कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥ ओठ हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा ॥2॥ तुका ह्मणे श्रम । एक विसरतां राम ॥3॥ 2006 आलें धरायच पेट । पुढें मागुतें न भेटे ॥1॥ होसी फजीती वरपडा । लक्ष चौ†यासीचे वेढां ॥ध्रु.॥ नाहीं कोणांचा सांगात । दुःख भोगितां आघात ॥2॥ एका पाउलाची वाट । कोणां सांगावा बोभाट ॥3॥ जुंतिजेसी घाणां । नाहीं मारित्या करुणा ॥4॥ तुका ह्मणे हित पाहें । जोंवरि हें हातीं आहे ॥5॥ 2007 लाभ जाला बहुतां दिसीं । लाहो करा पुढें नासी । मनुष्यदेहा ऐसी । उत्तमजोडी जोडिली ॥1॥ घेइप हरिनाम सादरें । भरा सुखाचीं भांडारें । जालिया व्यापारें । लाहो हेवा जोडीचा॥ध्रु.॥ घेउनि माप हातीं । काळ मोवी दिवस राती । चोर लाग घेती । पुढें तैसें पळावें ॥2॥ हित सावकासें । ह्मणे करीन तें पिसें । हातीं काय ऐसें । तुका ह्मणे नेणसी ॥3॥ ॥3॥ 2008 सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥1॥ मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥ होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥2॥ तुका ह्मणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥3॥ 2009 झरा लागला सुखाचा । ऐसा मापारी कइंचा ॥1॥ जो हें माप तोंडें धरी । सळे जाली ते आवरी ॥ध्रु.॥ जाले बहु काळ । कोणा नाहीं ऐसें बळ ॥2॥ तुका ह्मणे तळ । नाहीं पाहेसा सकळ ॥3॥ 2010 आह्मी बोलों तें तुज कळे । एक दोहीं ठायीं खेळे॥1॥ काय परिहाराचें काम । जाणें अंतरींचें राम ॥ध्रु.॥ कळोनियां काय चाड । माझी लोकांसी बडबड ॥2॥ कारण सवें एका । अवघें आहे ह्मणे तुका ॥3॥ 2011 उमटे तें ठायीं । तुझे निरोपावें पायीं ॥1॥ आह्मीं करावें चिंतन । तुझें नामसंकीर्तन ॥ध्रु.॥ भोजन भोजनाच्या काळीं। मागों करूनियां आळी ॥2॥ तुका ह्मणे माथां । भार तुझ्या पंढरिनाथा॥3॥ 2012 केला पण सांडी । ऐसियासी ह्मणती लंडी ॥1॥ आतां पाहा विचारून । समर्थासी बोले कोण ॥ध्रु.॥ आपला निवाड। आपणें चि करितां गोड ॥2॥ तुह्मीं आह्मीं देवा । बोलिला बोल सिद्धी न्यावा ॥3॥ आसे धुरे उणें । मागें सरे तुका ह्मणे॥4॥ 2013 न व्हावें तें जालें । तुह्मां आह्मांसी लागलें ॥1॥ आतां हालमाकलमें । भांडोनियां काढूं वर्में ॥ध्रु.॥ पाटोऑयासवेंसाटी। दिली रगटएाची गांठी ॥2॥ तुका ह्मणे हरी । आणूनियां करिन सरी ॥3॥ 2014 पतितमिरासी । ते म्यां धरिला जीवेंसी ॥1॥ आतां बिळया सांग कोण । ग्वाही तुझें माझें मन ॥ध्रु.॥ पावणांचा ठसा। दावीं मज तुझा कैसा ॥2॥ वाव तुका ह्मणे जालें । रोख पाहिजे दाविलें ॥3॥ 2015 करितां वेरझारा । उभा न राहासी वेव्हारा ॥1॥ हे तों झोंडाइऩचे चाळे । काय पोटीं तें न कळे ॥ध्रु.॥ आरगुणी मुग । बैसलासी जैसा बग ॥2॥ तुका ह्मणे किती । बुडविलीं आळवितीं॥3॥ 2016 नाहीं देणें घेणे । गोवी केली अभिमानें ॥1॥ आतां कां हो निवडूं नेदां । पांडुरंगा येवढा धंदा ॥ध्रु.॥ पांचांमधीं जावें । थोडएासाटीं फजित व्हावें ॥2॥ तुज ऐसी नाहीं । पांडुरंगा आह्मी कांहीं ॥3॥ टाकुं तो वेव्हार । तुज बहू करकर ॥4॥ तुका ह्मणे आतां । निवडूं संतां हें देखतां ॥5॥ ॥9॥ 2017 सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥1॥ नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥ पाणचो†याचें दार। वरिल दाटावें तें थोर ॥2॥ वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥3॥ एक चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥4॥ तुका ह्मणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥5॥ 2018 करूं याची कथा नामाचा गजर । आह्मां संवसार काय करी ॥1॥ ह्मणवूं हरिचे दास लेऊं तीं भूषणें । कांपे तयाभेणें किळकाळ ॥ध्रु.॥ आशा भय लाज आड नये चिंता । ऐसी तया सत्ता समर्थाची ॥2॥ तुका ह्मणे करूं ऐसियांचा संग । जेणें नव्हे भंग चिंतनाचा ॥3॥ ॥2॥ 2019 काय सर्प खातो अन्न । काय ध्यान बगाचें ॥1॥ अंतरींची बुिद्ध खोटी । भरलें पोटीं वाइऩट ॥ध्रु.॥ काय उंदीर नाहीं धांवीं । राख लावी गाढव ॥2॥ तुका ह्मणे सुसर जळीं । काउळीं कां न न्हाती ॥3॥ 2020 मदें मातलें नागवें नाचे । अनुचित वाचे बडबडी॥1॥ आतां शिकवावा कोणासी विचार । कर्म तें दुस्तर करवी धीट॥ध्रु.॥ आलें अंगासी तें बिळवंत गाढें । काय वेडएापुढें धर्मनीत ॥2॥ तुका ह्मणे कळों येइऩल तो भाव । अंगावरिल घाव उमटतां ॥3॥ ॥2॥ 2021 सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥1॥ परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥ अमृतें सागर भरवे ती गंगा । ह्मणवेल उगा राहें काळा ॥2॥ भूत भविष्य कळों येइऩल वर्तमान । करवती प्रसन्न रििद्धसिद्धी ॥3॥ स्थान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रह्मांडासी ॥4॥ तुका ह्मणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥5॥ ॥1॥ 2022 भाविकां हें वर्म सांपडलें निकें । सेविती कवतुकें धणीवरि ॥1॥ इिच्छतील तैसा नाचे त्यांचे छंदें । वंदिती तीं पदें सकुमारें ॥ध्रु.॥ विसरले मुHी भिHअभिळासें । ओढत सरिसें सुखा आलें ॥2॥ तुका ह्मणे नाहीं मागायाची आस । पांडुरंग त्यांस विसंबेना ॥3॥ 2023 भHां समागमें सर्वभावें हरि । सर्व काम करी न संगतां ॥1॥ सांटवला राहे हृदयसंपुष्टीं । बाहेर धाकुटी मूतिऩ उभा॥ध्रु.॥ मागण्याची वास पाहे मुखाकडे । चिंतिल्या रोकडे मनोरथ ॥2॥ तुका ह्मणे जीव भाव देवापायीं । ठेवूनि ते कांहीं न मगती ॥3॥ 2024 प्रेमअमृतें रसना ओलावली । मनाची राहिली वृित्त पायीं ॥1॥ सकळ ही तेथें वोळलीं मंगळें । वृिष्ट केली जळें आनंदाच्या ॥ध्रु.॥ सकळ इंिद्रयें जालीं ब्रह्मरूप । ओतलें स्वरूप माजी तया ॥2॥ तुका ह्मणे जेथें वसे भHराव । तेथें नांदे देव संदेह नाहीं ॥3॥ ॥3॥ 2025 कासया गुणदोष पाहों आणिकांचे । मज काय त्यांचें उणें असे ॥1॥ काय पापपुण्य पाहों आणिकांचें । मज काय त्यांचें उणें असें ॥ध्रु.॥ नष्टदुष्टपण कवणाचें वाणू । तयाहून आनु अधिक माझें ॥2॥ कुचर खोटा मज कोण असे आगळा । तो मी पाहों डोळां आपुलिये ॥3॥ तुका ह्मणे मी भांडवलें पुरता । तुजसी पंढरिनाथा लावियेलें ॥4॥ ॥1॥ 2026 काळ जविळ च उभा नेणां । घाली झांपडी खुंटी कानां ॥1॥ कैसा हुशार सावध राहीं । आपुला तूं अपुलेठायीं॥ध्रु.॥ काळ जविळच उभा पाहीं । नेदी कोणासि देऊं कांहीं ॥2॥ काळें पुरविली पाठी । वरुषें जालीं तरी साठी ॥3॥ काळ भोंवताला भोंवे। राम येऊं नेदी जिव्हे ॥4॥ तुका ह्मणे काळा । कर्म मिळतें तें जाळा ॥5॥ ॥1॥ 2027 दुष्ट भूषण सज्जनाचें । अलभ्यलाभ पुण्य त्याचें॥1॥ धन्य ऐसा परउपकारी । जाय नरका आणिकांवारि ॥ध्रु.॥ मळ खाये संवदणी । करी आणिकांची उजळणी ॥2॥ तुका ह्मणे त्याचा । प्रीती आदर करा साचा ॥3॥ 2028 साहोनियां टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें॥1॥ तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥ बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥2॥ तुका ह्मणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥3॥ ॥2॥ 2029 तेणें वेशें माझीं चोरिलीं अंगें । मानावया जग आत्मैपणे। नाहीं चाड भीड संसाराचें कोड । उदासीन सर्व गुणें । भय मोह लज्जा निरसली शंका । अवघियां एक चि पणें । विठ्ठलाच्या पायीं बैसोनि राहिलीं । भागलीं नुटित तेणें ॥1॥ आतां त्यांसीं काय चाले माझें बळ । जालोंसें दुर्बळ सkवहीन । दग्ध पट दिसे संगति बरवंट । काय त्याचें कारण ॥ध्रु.॥ आळसें दृष्टी न पाहे आपुलें । एक चि देखिलें सर्वरूप । मानामान तेथें खुंटोनि राहिलें । पिसुन तो कोण बाप । ज्योति ना अंधार अवघा एकंकार। तेथें काय पुण्यपाप । विठ्ठलावांचुनि कांहीं च नावडे । वेगळाल्या भावें रूप ॥2॥ बळबडिवार लौकिक वेव्हार । गेली आशा तृष्णा माया । सुखदुःखाची वार्ता नाइके । अंतरलों दुरी तया । मीतूंपणनिःकाम होऊनि । राहिलों आपुलिया ठायां । तुजविण आतां मज नाहीं कोणी । तुका ह्मणे देवराया ॥3॥ ॥1॥ 2030 कथा पुराण ऐकतां । झोंप नाथिलि तkवता । खाटेवरि पडतां । व्यापी चिंता तळमळ ॥1॥ ऐसी गहन कर्मगति। काय तयासी रडती । जाले जाणते जो चित्तीं । कांहीं नेघे आपुला॥ध्रु.॥ उदक लावितां न धरे । चिंता करी केव्हां सरे । जाऊं नका धीरें । ह्मणे करितां ढवाऑया ॥2॥ जवळी गोंचिड क्षीरा । जैसी कमळणी ददुऩरा । तुका ह्मणे दुरा । देशत्यागें तयासी ॥3॥ 2031 संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे। भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥1॥ आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां । शुकनिळकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकिळया ॥ध्रु॥ पापपुण्य कैसे भांजिले अख । दशकाचा एक उरविला । जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥2॥ दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न ह्मणें चाडा । धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका ह्मणे जाण पावे पीडा ॥3॥ ॥2॥ 2032 कथे उभा अंग राखे जो कोणी । ऐसा कोण गणी तया पापा ॥1॥ येथें तो पातकी न येता च भला । रणीं कुचराला काय चाले ॥ध्रु.॥ कथे बैसोनी आणीक चर्चा । धिग त्याची वाचा कुंभपाक ॥2॥ तुका ह्मणे ऐलपैल ते थडीचे । बुडतील साच मध्यभागीं ॥3॥ 2033 नावडे ज्या कथा उठोनियां जाती । ते यमा फावती बरे वोजा ॥1॥ तो असे जवळी गोंचिडाच्या न्यायें । देशत्यागें ठायें तया दुरी ॥ध्रु.॥ नव्हे भला कोणी नावडे दुसरा । पाहुणा किंकरा यमा होय ॥2॥ तुका ह्मणे तया करावें तें काइऩ । पाषाण कां नाहीं जळामध्यें ॥3॥ 2034 जवळी नाहीं चित्त । काय मांडियेलें प्रेत ॥1॥ कैसा पाहे चिद्रद्रािष्ट । दीप स्नेहाच्या शेवटीं ॥ध्रु.॥ कांतेलेंसें श्वान । तैसें दिशा हिंडे मन ॥2॥ त्याचे कानीं हाणे । कोण बोंब तुका ह्मणे॥3॥ 2035 दुर्बळा वाणीच्या एक दोनि सििद्ध । सदैवा समाधि विश्वरूपीं ॥1॥ काय त्याचें वांयां गेलें तें एक । सदा प्रेमसुख सर्वकाळ ॥ध्रु.॥ तीर्थ देव दुरी तया भाग्यहीना । विश्व त्या सज्जना दुमदुमिलें ॥2॥ तुका ह्मणे एक वाहाती मोिळया । भाग्यें आगिळया घरा येती ॥3॥ ॥4॥ 2036 परिमळें काष्ठ ताजवां तुळविलें । आणीक नांवांचीं थोडीं । एक तें कातिवें उभविलीं ढवळारें एकाचिया कुड मेडी । एक दीनरूप आणिती मेिळया । एक ते बांधोनि माडी अवघियां बाजार एक चि जाला । मांविकलीं आपुल्या पाडीं ॥1॥ गुण तो सार रूपमध्यकार । अवगुण तो फार पीडीतसे ॥ध्रु.॥ एक गुणें आगळे असती । अमोल्य नांवांचे खडे । एक समर्थ दुर्बळा घरीं फार मोलाचे थोडे । एक झगमग करिती वाळवंटीं । कोणी न पाहाती तयांकडे सभाग्य संपन्न आपुलाले घरीं । मायेक दैन्य बापुडें ॥2॥ एक मानें रूपें सारिख्या असती । अनेकप्रकार याती। ज्याचिया संचितें जैसें आलें पुढें तयाची तैसी च गति । एक उंचपदीं बैसउनि सुखें । दास्य करवी एका हातीं तुका ह्मणे कां मानिती सुख । चुकलिया वांयां खंती ॥3॥ ॥1॥ 2037 नाहीं आह्मां शत्रु सासुरें पिसुन । दाटलें हें घन माहियेर ॥1॥ पाहें तेथें पांडुरंग रखुमाइऩ । सत्यभामा राही जननिया॥ध्रु.॥ लज्जा भय कांही आह्मां चिंता नाहीं । सर्वसुखें पायीं वोळगती ॥2॥ तुका ह्मणे आह्मी सदैवाचीं बाळें । जालों लडिवाळें सकळांचीं ॥3॥ 2038 गभाअ असतां बाळा । कोण पाळी त्याचा लळा॥1॥ कैसा लाघवी सूत्रधारी । कृपाळुवा माझा हरी ॥ध्रु.॥ सर्प पिलीं वितां चि खाय । वांचलिया कोण माय ॥2॥ गगनीं लागला कोसरा । कोण पुरवी तेथें चारा ॥3॥ पोटीं पाषाणांचे जीव । कवण जीव त्याचा भाव ॥4॥ तुका ह्मणे निश्चळ राहें । होइऩल तें सहज पाहें ॥5॥ 2039 न ह्मणे कवणां सिद्ध साधक गंव्हार । अवघा विश्वंभर वांचूनियां ॥1॥ ऐसें माझे बुिद्ध काया वाचा मन । लावीं तुझें ध्यान पांडुरंगा ॥ध्रु.॥ गातां प्रेमगुण शंका माझ्या मनीं । नाचतां रंगणीं नाठवावी ॥2॥ देइप चरणसेवा भूतांचें भजन । वर्णा अभिमान सांडवूनि ॥3॥ आशापाश माझी तोडीं माया चिंता । तुजविण वेथा नको कांहीं ॥4॥ तुका ह्मणे सर्व भाव तुझे पायीं । राहे ऐसें देइप प्रेम देवा ॥5॥ 2040 अिग्नमाजी गेलें । अिग्न होऊन तें च ठेलें ॥1॥ काय उरलें तया पण । मागील तें नाम गुण ॥ध्रु.॥ लोह लागेपरिसा अंगीं । तो ही भूषण जाला जगीं ॥2॥ सरिता वोहळा ओघा। गंगे मिळोनि जाल्या गंगा ॥3॥ चंदनाच्या वासें । तरु चंदन जालेस्पर्शे॥4॥ तुका जडला संतां पायीं । दुजेपणा ठाव नाहीं॥5॥ ॥4॥ 2041 ऐशा भाग्यें जालों । तरी धन्य जन्मा आलों ॥1॥ रुळें तळीले पायरी । संत पाय देती वरी ॥ध्रु.॥ प्रेमामृतपान । होइऩल चरणरजें स्नान ॥2॥ तुका ह्मणे सुखें । तया हरतील दुःखें॥3॥ 2042 करितां या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥1॥ माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥ध्रु.॥ ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारितां कांहीं ॥2॥ तुका ह्मणे गोड । तेथें पुरे माझें कोड॥3॥ ॥2॥ 2043 वेद जया गाती । आह्मां तयाची संगति ॥1॥ नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥ ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥2॥ तुका ह्मणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥3॥ 2044 तूं श्रीयेचा पति । माझी बहु हीन याती ॥1॥ दोघे असों एके ठायीं । माझा माथा तुझे पायीं ॥ध्रु.॥ माझ्या दीनपणां पार । नाहीं बहु तूं उदार ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । मी ओहोळ तूं गंगा ॥3॥ 2045 मी याचक तूं दाता । काय सत्य पाहों आतां ॥1॥ म्या तों पसरिला हात । करीं आपुलें उचित ॥ध्रु.॥ आह्मी घ्यावें नाम । तुह्मां समाधान काम ॥2॥ तुका ह्मणे देवराजा । वाद खंडीं तुझा माझा ॥3॥ 2046 तुझे पोटीं ठाव । व्हावा ऐसा माझा भाव ॥1॥ करीं वासनेसारिखें । प्राण फुटे येणें दुःखें ॥ध्रु.॥ अहंकार खोटे । वाटे श्वापदांची थाटे ॥2॥ तुका ह्मणे आइऩ । हातीं धरूनि संग देइऩ ॥3॥ 2047 दारीं परोवरी । कुडीं कवाडीं मी घरीं ॥1॥ तुमच्या लागलों पोषणा । अवघे ठायीं नारायणा ॥ध्रु.॥ नेदीं खाऊं जेवूं । हातींतोंडींचें ही घेऊं ॥2 ॥ तुका ह्मणे अंगीं । जडलों ठायींचा सलगी ॥3॥ 2048 मज कोणी कांहीं करी । उमटे तुमचे अंतरीं ॥1॥ व्याला वाडविलें ह्मुण । मज सुख तुज सीण ॥ध्रु.॥ माझें पोट धालें। तुझे अंगीं उमटलें ॥2॥ तुका ह्मणे खेळें । तेथें तुमचिया बळें ॥3॥ 2049 जोडोनियां कर । उभा राहिलों समोर ॥1॥ हें चि माझेंभांडवल।जाणे कारण विठ्ठल ॥ध्रु.॥ भाकितों करुणा । आतां नुपेक्षावें दीना ॥2॥ तुका ह्मणे डोइऩ । ठेवीं वेळोवेळां पायीं ॥3॥ 2050 आह्मी घ्यावें तुझें नाम । तुह्मी आह्मां द्यावें प्रेम॥1॥ ऐसें निवडिलें मुळीं । संतीं बैसोनि सकळीं ॥ध्रु.॥ माझी डोइऩ पायांवरी । तुह्मी न धरावी दुरी ॥2॥ तुका ह्मणे केला । खंड दोघांचा विठ्ठला ॥3॥ 2051 वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥1॥ न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥ जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥2॥ तुका ह्मणे देवा । करीन ते घ्यावी सेवा॥3॥ 2052 पायरवे अन्न । मग करी क्षीदक्षीण ॥1॥ ऐसे होती घातपात । लाभे विण संगें थीत ॥ध्रु.॥ जन्माची जोडी । वाताहात एके घडी ॥2॥ तुका ह्मणे शंका । हित आड या लौकिका ॥3॥ 2053 आह्मांवैष्णवांचा।नेमकायामनेंवाचा॥1॥ धीर धरूं जिवासाटीं । येऊं नेदूं लाभा तुटी ॥ध्रु.॥ उचित समय । लाजनिवारावें भय ॥2॥ तुका ह्मणे कळा । जाणों नेम नाहीं बाळा ॥3॥ 2054 उलंघिली लाज । तेणें साधियेलें काज ॥1॥ सुखें नाचे पैलतीरीं । गेलों भवाचे सागरीं ॥ध्रु.॥ नामाची सांगडी । सुखें बांधली आवडी ॥2॥ तुका ह्मणे लोकां । उरली वाचा मारीं हाका॥3॥ 2055 बैसलोंसे दारीं । धरणें कोंडोनि भिकारी ॥1॥ आतां कोठें हालों नेदीं । बरी सांपडली संदी ॥ध्रु.॥ किती वेरझारा । मागें घातलीया घरा ॥2॥ माझें मज नारायणा । देतां ां रे नये मना॥3॥ भांडावें तें किती । बहु सोसिली फजिती ॥4॥ तुका ह्मणे नाहीं । लाज तुझे अंगीं कांहीं ॥5॥ 2056 जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥1॥ नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥ करूनियां नीती। दिल्याप्रमाणें चालती ॥2॥ हातीं दंड काठी । भा जिवाचिये साटीं॥3॥ बळ बुद्धी युHी । तुज दिल्या सर्व शHी ॥4॥ तुका ह्मणे खरा । आतां घेइऩन मुशारा ॥5॥ 2057 फळाची तों पोटीं । घडे वियोगें ही भेटी ॥1॥ करावें चिंतन । सार तें चि आठवण ॥ध्रु.॥ चित्त चित्ता ग्वाही । उपचारें चाड नाहीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । पावे ंतरींची सेवा॥3॥ ॥15॥ 2058 दुर्बळाचें कोण । ऐके घालूनियां मन । राहिलें कारण। तयावांचूनि काय तें ॥1॥ कळों आलें अनुभवें । पांडुरंगा माझ्या जीवें । न संगतां ठावें । पडे चर्या देखोनि ॥ध्रु.॥ काम क्रोध माझा देहीं । भेदाभेद ोले नाहीं । होतें तेथें कांहीं । तुज कृपा करितां॥2॥ हें तों नव्हे उचित । नुपेक्षावें शरणागत । तुका ह्मणे रीत । तुमची आह्मां न कळे ॥3॥ 2059 आह्मी भाव जाणों देवा । न कळती तुझिया मावा । गणिकेचा कुढावा । पतना न्यावा दशरथ ॥1॥ तरी म्यां काय गा करावें । कोण्या रीती तुज पावें । न संगतां ठावें । तुह्मांविण न पडे॥ध्रु.॥ दोनी फाकलिया वाटा । ाोवी केला घटापटा । नव्हे धीर फांटा । आड रानें भरती ॥2॥ तुका ह्मणे माझे डोळे । तुझे देखती हे चाळे । आतां येणें वेळे । चरण जीवें न सोडीं ॥3॥ 2060 वेरझारीं जाला सीण । बहु केलें क्षीदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥1॥ आतां काय भीड भार । धरूनियां लोकचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥ आलें बहुतांच्या मना । कां रे न ोसी ााहाणा । मुळींच्या वचना । आह्मी जागों आपुल्या ॥2॥ तुका ह्मणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥3॥ ॥3॥ 2061 कल्पतरूखालीं । फळें येती मागीतलीं ॥1॥ तेथें बैसल्याचा भाव । विचारूनि बोलें ठाव ॥ध्रु.॥ द्यावें तें उत्तर । येतो प्रतित्याचा फेर ॥2॥ तुका ह्मणे मनीं । आपुल्या च लाभहानि॥3॥ 2062 रंगलें या रंगें पालट न घरी । खेवलें अंतरीं पालटेना॥1॥ सावळें निखळ कृष्णनाम ठसे । अंगसंगें कैसे शोभा देती ॥ध्रु.॥ पवित्र जालें तें न लिंपे विटाळा । नैदी बैसों मला आडवरी ॥2॥ तुका ह्मणे काळें काळें केलें तोंड । प्रकाश अभंड देखोनियां ॥3॥ 2063 जगा काळ खाय । आह्मी माथां दिले पाय ॥1॥ नाचों तेथें उभा राहे । जातां व्यंग करी साहे ॥ध्रु.॥ हरिच्या गुणें धाला । होता खात चि भुकेला ॥2॥ तुका ह्मणे हळु । जाला कढत शीतळु ॥3॥ ॥3॥ 2064 ब्रह्मरस घेइप काढा । जेणें पीडा वारेल ॥1॥ पथ्य नाम विठोबाचें । अणीक वाचे न सेवीं ॥ध्रु.॥ भवरोगाऐसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥2॥ तुका ह्मणे नव्हे बाधा । अणीक कदा भूतांची ॥3॥ 2065 अंगें अनुभव जाला मज । संतरजचरणांचा ॥1॥ सुखी जालों या सेवनें । दुःख नेणें यावरी ॥ध्रु.॥ निर्माल्याचें तुळसीदळ । विष्णुजळ चरणींचें ॥2॥ तुका ह्मणे भावसार । करूनि फार मििश्रत ॥3॥ 2066 वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥1॥ रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥ नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥2॥ तुका ह्मणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥3॥ 2067 करितां कोणाचें ही काज । नाहीं लाज देवासी ॥1॥ बरे करावें हें काम । धरिलें नाम दीनबंधु ॥ध्रु.॥ करुनि अराणूक पाहे । भलत्या साहए व्हावया ॥2॥ बोले तैसी करणी करी । तुका ह्मणे एक हरि ॥3॥ ॥4॥ 2068 उभें चंद्रभागे तीरीं । कट धरोनियां करीं । पाउलें गोजिरीं । विटेवरी शोभलीं ॥1॥ त्याचा छंद माझ्या जीवा । काया वाचा मनें हेवा । संचिताचा ठेवा । जोडी हातीं लागली ॥ध्रु.॥ रूप डोिळयां आवडे । कीतिऩ श्रवणीं पवाडे । मस्तक नावडे । उठों पायांवरोनि ॥2॥ तुका ह्मणे नाम । ज्याचें नासी क्रोध काम । हरी भवश्रम । उच्चारितां वाचेसी ॥3॥ 2069 आह्मां हें चि भांडवल । ह्मणों विठ्ठल विठ्ठल ॥1॥ सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥ बाखराचें वाण। सांडूं हें जेवूं जेवण ॥2॥ न लगे वारंवार । तुका ह्मणे वेरझार ॥3॥ 2070 आतां माझ्या भावा । अंतराय नको देवा ॥1॥ आलें भागा तें करितों । तुझें नाम उच्चारितों ॥ध्रु.॥ दृढ माझें मन। येथें राखावें बांधोन ॥2॥ तुका ह्मणे वाटे । नको फुटों देऊं फांटे॥3॥ ॥3॥ 2071 काय देवापाशीं उणें । हिंडे दारोदारीं सुनें ॥1॥ करी अक्षरांची आटी । एके कवडी च साटीं ॥ध्रु.॥ निंदी कोणां स्तवी । चिंतातुर सदा जीवीं ॥2॥ तुका ह्मणे भांड । जलो जळो त्याचें तोंड ॥3॥ 2072 मागणें तें मागों देवा । करूं भHी त्याची सेवा ॥1॥ काय उणे तयापाशीं । रििद्धसिद्धी ज्याच्या दासी ॥ध्रु.॥ कायावाचामन । करूं देवा हें अर्पण ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभर । ज्याच्यानें हें चराचर ॥3॥ 2073 चित्तीं नाहीं आस । त्याचा पांडुरंग दास ॥1॥ असे भHांचिये घरीं । काम न संगतां करी ॥ध्रु.॥ अनाथाचा बंधु । असे अंगीं हा संबंधुं ॥2॥ तुका ह्मणे भावें । देवा सत्ता राबवावें ॥3॥ 2074 कर्कशसंगति । दुःख उदंड फजिती ॥1॥ नाहीं इह ना परलोक । मजुर दिसे जैसें रंक ॥ध्रु.॥ वचन सेंटावरी । त्याचें ठेवूनि धिक्कारी ॥2॥ तुका ह्मणे पायीं बेडी । पडिली कपाळीं कु†हाडी ॥3॥ ॥4॥ 2075 बीज पेरे सेतीं । मग गाडेवरी वाहाती ॥1॥ वांयां गेलें ऐसें दिसे । लाभ त्याचे अंगीं वसे ॥ध्रु.॥ पाल्याची जतन । तरि प्रांतीं येती कण ॥2॥ तुका ह्मणे आळा । उदक देतां लाभे फळा ॥3॥ 2076 जाणावें तें सार । नाहीं तरी दगा फार ॥1॥ डोळे झांकिलिया रवि । नाहीं ऐसा होय जेवीं ॥ध्रु.॥ बहुथोडएा आड । निवारितां लाभें जाड ॥2॥ तुका ह्मणे खरें । नेलें हातींचे अंधारें॥3॥ 2077 मुळीं नेणपण । जाला तरी अभिमान ॥1॥ वांयां जावें हें चि खरें । केलें तेणें चि प्रकारें ॥ध्रु.॥ अराणूक नाहीं कधीं। जाली तरि भेदबुिद्ध ॥2॥ अंतरली नाव । तुका ह्मणे नाहीं ठाव॥3॥ ॥3॥ 2078 संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥1॥ लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साहए येथें ॥ध्रु.॥ शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥2॥ तुका ह्मणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥3॥ 2079 सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥1॥ पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥ वेचल्याचा पाहे वरावरि झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥2॥ तुका ह्मणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥3॥ 2080 बुिद्धमंद शिरीं । भार फजिती पदरीं ॥1॥ जाय तेथें अपमान । पावे हाणी थुंकी जन ॥ध्रु.॥ खरियाचा पाड । मागें लावावें लिगाड ॥2॥ तुका ह्मणे करी । वर्म नेणें भरोवरी ॥3॥ ॥3॥ 2081 पूर्वजांसी नकाऩ । जाणें तें आइका ॥1॥ निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥ मात्रागमना ऐसी।जोडी पातकांची रासी ॥2॥ तुका ह्मणे वाट । कुंभपाकाची ते नीट॥ 2082 वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥ देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥1॥ कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥2॥ लेंकरें वित्त पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥3॥ आपुली शुिद्ध जया नाहीं । आणिकांची ते जाणे काइऩ ॥4॥ तुका ह्मणे ऐसे जन । नकाऩ जातां राखे कोण ॥5॥ 2083 आवडीचें दान देतो नारायण । बाहे उभारोनि राहिलासे॥1॥ जें जयासी रुचे तें करी समोर । सर्वYा उदार मायबाप ॥ध्रु.॥ ठायीं पडिलिया तें चि लागे खावें । ठायींचे चि घ्यावें विचारूनि ॥2॥ बीज पेरूनियां तें चि घ्यावें फळ । डोरलीस केळ कैंचें लागे ॥3॥ तुका ह्मणे देवा कांहीं बोल नाहीं । तुझा तूं चि पाहीं शत्रु सखा ॥4॥ 2084 अडचणीचें दार । बाहेर माजी पैस फार ॥1॥ काय करावें तें मौन्य । दाही दिशा हिंडे मन ॥ध्रु.॥ बाहेर दावी वेश । माजी वासनेचे लेश ॥2॥ नाहीं इंिद्रयां दमन । काय मांडिला दुकान ॥3॥ सारविलें निकें । वरि माजी अवघें फिकें ॥4॥ तुका ह्मणे अंतीं । कांहीं न लगे चि हातीं ॥5॥ 2085 लय लक्षूनियां जालों ह्मणती देव । तो ही नव्हे भाव सत्य जाणा ॥1॥ जालों बहुश्रुत न लगे आतां कांहीं । नको राहूं ते ही नििश्चतीनें ॥ध्रु.॥ तपें दान काय मानिसी विश्वास । बीज फळ त्यास आहे पुढें ॥2॥ कर्म आचरण यातीचा स्वगुण । विशेष तो गुण काय तेथें ॥3॥ तुका ह्मणे जरी होइऩल निष्काम । तरि च होय राम देखे डोळां ॥4॥ ॥5॥ 2086 पुरली धांव कडिये घेइप । पुढें पायीं न चलवीं ॥1॥ कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥ अवघी निवारावी भूक। अवघ्या दुःख जन्माचें ॥2॥ तुका ह्मणे बोलवेना । लावीं स्तनां विश्वरें ॥3॥ 2087 जें जें मना वाटे गोड । तें तें कोड पुरविसी ॥1॥ आतां तूं चि बाहएात्कारीं । अवघ्यापरी जालासी ॥ध्रु.॥ नाहीं सायासाचें काम । घेतां नाम आवडी ॥2॥ तुका ह्मणे सर्वसांगे । पांडुरंगे दयाळे ॥3॥ 2088 जेथें माझी दृिष्ट जाय । तेथें पाय भावीन ॥1॥ असेन या समाधानें । पूजा मनें करीन ॥ध्रु.॥ अवघा च अवघे देसी। सुख घेवविसी संपन्न ॥2॥ तुका ह्मणे बंधन नाहीं । ऐसें कांहीं ते करूं ॥3॥ ॥3॥ 2089 नातुडे जो कवणे परी । उभा केला विटेवरी ॥1॥ भला भला पुंडलिका । मानलासी जनलोकां ॥ध्रु.॥ कोण्या काळें सुखा। ऐशा कोण पावता ॥2॥ अवघा आणिला परिवार । गोपी गोपाळांचा भार ॥3॥ तुका ह्मणे धन्य जालें । भूमी वैकुंठ आणिलें॥4॥ 2090 अवघे चुकविले सायास । तप रासी जीवा नास॥1॥ जीव देऊनियां बळी । अवघीं तारिलीं दुर्बळीं । केला भूमंडळीं । माजी थोर पवाडा ॥ध्रु.॥ कांहीं न मगे याची गती । लुटवितो जगा हातीं ॥2॥ तुका ह्मणे भHराजा । कोण वर्णी पार तुझा ॥3॥ 2091 प्रमाण हें त्याच्या बोला । देव भHांचा अंकिला॥1॥ न पुसतां जातां नये । खालीं बैसतां ही भिये ॥ध्रु.॥ अवघा त्याचा होत । जीव भावाही सहित ॥2॥ वदे उपचाराची वाणी । कांहीं माग ह्मणऊनि ॥3॥ उदासीनाच्या लागें । तुका ह्मणे धांवे मागें॥4॥ 2092 कांहीं न मागती देवा । त्यांची करूं धांवे सेवा ॥1॥ हळूहळू फेडी ॠण । होऊनियां रूपें दीन ॥ध्रु.॥ होऊं न सके वेगळा । क्षण एक त्यां निराळा ॥2॥ तुका ह्मणे भिHभाव । हा चि देवाचा ही देव ॥3॥ 2093 जाणे अंतरिंचा भाव । तो चि करितो उपाव ॥1॥ न लगें सांगावें मांगावें ॥ जीवें भावें अनुसरावें । अविनाश घ्यावें। फळ धीर धरोनि ॥ध्रु.॥ बाळा न मागतां भोजन । माता घाली पाचारून ॥2॥ तुका ह्मणे तरी । एकीं लंघियेले गिरी ॥3॥ 2094 आह्मी नाचों तेणें सुखें । वाऊं टाळी गातों मुखें॥1॥ देव कृपेचा कोंवळा । शरणागता पाळी लळा ॥ध्रु.॥ आह्मां जाला हा निर्धार । मागें तारिलें अपार ॥2॥ तुका ह्मणे संतीं । वर्म दिलें आह्मां हातीं ॥3॥ 2095 जालों निर्भर मानसीं । ह्मणऊनि कळलासी ॥1॥ तुझे ह्मणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥ चुकविसी पाश । गर्भवासयातना ॥2॥ तुझें जाणोनियां वर्म । कंठीं धरियेलें नाम ॥3॥ तुका ह्मणे तेणें सुखें । विसरलों जन्मदुःख ॥4॥ ॥7॥ 2096 नको दुष्टसंग । पडे भजनामधीं भंग ॥1॥ काय विचार देखिला । सांग माझा तो विठ्ठला ॥ध्रु.॥ तुज निषेधितां । मज न साहे सर्वथा ॥2॥ एका माझ्या जीवें । वाद करूं कोणासवें॥3॥ तुझे वणूप गुण । कीं हे राखों दुष्टजन ॥4॥ काय करूं एका। मुखें सांग ह्मणे तुका ॥5॥ 2097 विठ्ठल माझी माय । आह्मां सुखा उणें काय ॥1॥ घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥ क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥2॥ तुका ह्मणे कृपावंत । ठेवीं आह्मांपाशीं चित्त ॥3॥ 2098 भिHसुखें जे मातले । ते किळकाळा शूर जाले॥1॥ हातीं बाण हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे ॥ध्रु.॥ महां दोषां आला त्रास । जन्ममरणां केला नाश ॥2॥ सहस्रनामाची आरोळी। एक एकाहूनि बळी ॥3॥ नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचें अंकित त्यावांचून ॥4॥ तुका ह्मणे त्यांच्या घरीं । मोक्षसिद्धी या कामारी॥5॥ ॥3॥ 2099 पंधरां दिवसां एक एकादशी । कां रे न करिसी व्रतसार ॥1॥ काय तुझा जीव जातो एका दिसें । फराळाच्या मिसें धणी घेसी ॥ध्रु.॥ स्वहित कारण मानवेल जन । हरिकथा पूजन वैष्णवांचें ॥2॥ थोडे तुज घरीं होती उजगरे । देउळासी कां रे मरसी जातां ॥3॥ तुका ह्मणे कां रे सकुमार जालासी । काय जाब देसी यमदूतां ॥4॥ 2100 कथा हें भूषण जनामध्यें सार । तरले अपार बहुत येणें ॥1॥ नीचिये कुळींचा उंचा वंद्य होय । हरीचे जो गाय गुणवाद ॥ध्रु.॥ देव त्याची माथां वंदी पायधुळी । दीप झाला कुळीं वंशाचिये ॥2॥ त्याची निंदा करी त्याची कुष्ठ वाणी । मुख संवदणी रजकाची ॥3॥ तुका ह्मणे नाहीं चोरीचा व्यापार । विठ्ठलाचें सार नाम ध्यावें ॥4॥ [[वर्ग:गाथा]] f5tvcb3qriy3q5vky1jkx2t86zvozi3 तुकाराम गाथा/ २१०१ ते २४०० 0 1540 36913 36879 2026-09-19T19:43:31Z QueerEcofeminist 1879 Restored revision 4998 by [[Special:Contributions/Mahitgar|Mahitgar]] ([[en:w:User:BrandonXLF/Restorer|Restorer]]) 36913 wikitext text/x-wiki [[Category:Transferable to Marathi Wikisource]] 2101 टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥1॥ गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥ आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥2॥ तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥3॥ तुका ह्मणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥4॥ ॥3॥ 2102 देखोवेखीं करिती गुरू । नाहीं ठाउका विचारु॥1॥ वर्म तें न पडे ठायीं । पांडुरंगाविण कांहीं ॥ध्रु.॥ शिकों कळा शिकों येती । प्रेम नाहीं कोणां हातीं ॥2॥ तुका ह्मणे सार । भिH नेणती गव्हार ॥3॥ 2103 भाग्यवंत ह्मणों तयां । शरण गेले पंढरिराया ॥1॥ तरले तरले हा भरवसा । नामधारकांचा ठसा ॥ध्रु.॥ भुिHमुHीचें तें स्थळ । भाविकनिर्मळ निर्मळ ॥2॥ गाइलें पुराणीं । तुका ह्मणे वेदवाणी ॥3॥ 2104 जैसें चित्त जयावरी । तैसें जवळी तें दुरी ॥1॥ न लगे द्यावा परिहार । या कोरडें उत्तर । असे अभ्यंतर । साक्षभूत जवळी ॥ध्रु.॥ अवघें जाणे सूत्रधारी । कोण नाचे कोणे परी ॥2॥ तुका ह्मणे बुिद्ध । ज्याची ते च तया सििद्ध ॥3॥ 2105 नाहीं पाइतन भूपतीशीं दावा । धिग त्या कर्तव्या आगी लागो ॥1॥ मुंगियांच्या मुखा गजाचा आहार । न साहावे भार जाय जीवें ॥2॥ तुका ह्मणे आधीं करावा विचार । शूरपणें तीर मोकलावा ॥3॥ 2106 तिन्ही लोक ॠणें बांधिले जयानें । सर्वसििद्ध केणें तये घरीं ॥1॥ पंढरीचोहोटां घातला दुकान । मांडियेले वान आवडीचे ॥ध्रु.॥ आषाढी कातिऩकी भरियेले हाट । इनाम हे पेंठ घेतां देतां ॥2॥ मुिH कोणी तेथें हातीं नेघे फुका । लुटितील सुखा प्रेमाचिया ॥3॥ तुका ह्मणे संतसज्जन भाग्याचें । अनंतां जन्मींचे सांटेकरी ॥4॥ 2107 दुःखाचिये साटीं तेथें मिळे सुख । अनाथाची भूक दैन्य जाय ॥1॥ उदाराचा राणा पंढरीस आहे । उभारोनि बाहे पालवितो ॥1॥ जाणतियाहूनि नेणत्याची गोडी । आिंळगी आवडी करूनियां ॥2॥ शीण घेऊनियां प्रेम देतो साटी । न विचारी तुटी लाभा कांहीं ॥3॥ तुका ह्मणे असों अनाथ दुबळीं । आह्मांसी तो पाळी पांडुरंग ॥4॥ 2108 आणिक मात माझ्या नावडे जीवासी । काय करूं यासी पांडुरंगा ॥1॥ मुखा तें चि गोड श्रवणां आवडी । चित्त माझें ओढी तुझे पायीं ॥ध्रु.॥ जये पदीं नाहीं विठ्ठलाचें नाम । मज होती श्रम आइकतां ॥2॥ आणिकाचें मज ह्मणवितां लाज । वाटे हें सहज न बोलावें ॥3॥ तुका ह्मणे मज तूं च आवडसी । सर्वभावेंविसीं पांडुरंगा ॥4॥ 2109 कळेल हें तैसें गाइऩन मी तुज । जनासवें काज काय माझें ॥1॥ करीन मी स्तुती आपुले आवडी । जैसी माझ्या गोडी वाटे जीवा ॥ध्रु.॥ होऊनी निर्भर नाचेन मी छंदें । आपुल्या आनंदें करूनियां ॥2॥ काय करूं कळा युHी या कुसरी । जाणिवेच्या परी सकिळका ॥3॥ तुका ह्मणे माझें जयासवें काज । भोळा तो सहज पांडुरंग ॥4॥ 2110 तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥1॥ उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥ कोळें भिल्लें पशु श्वापदें अपारें । कृपेच्या सागरें तारियेलीं ॥2॥ काय तें गोपाळें चांगलीं शाहाणीं । तयां चक्रपाणी जेवी सवें ॥3॥ तुका ह्मणे भोळा भाविक हा देव । आह्मी त्याचे पाव धरूनी ठेलों ॥4॥ 2111 न लगे पाहावें अबद्ध वांकडें । उच्चारावें कोडें नाम तुझें ॥1॥ नाहीं वेळ नाहीं पंडितांचा धाक । होत कां वाचक वेदवHे ॥ध्रु.॥ पुराणीं ही कोठें न मिळे पाहातां । तैशीं या अनंता ठेवूं नामें ॥2॥ आपुलिया मना उपजे आनंद । तैसे करूं छंद कथेकाळीं ॥3॥ तुका ह्मणे आह्मी आनंदें चि धालों । आनंद चि ल्यालों अळंकार ॥4॥ 2112 दैन्य दुःख आह्मां न येती जवळी । दहन हे होळी होती दोष ॥1॥ सर्व सुखें येती मानें लोटांगणीं । कोण यांसी आणी दृष्टीपुढें ॥ध्रु.॥ आमुची आवडी संतसमागम । आणीक त्या नाम विठोबाचें ॥2॥ आमचें मागणें मागों त्याची सेवा । मोक्षाची निद।वा कोणा चाड ॥3॥ तुका ह्मणे पोटीं सांटविला देव । नुन्य तो भाव कोण आह्मां ॥4॥ 2113 काळतोंडा सुना । भलतें चोरुनि करी जना ॥1॥ धिग त्याचें साधुपण । विटाळुनि वर्ते मन ॥ध्रु.॥ मंत्र ऐसे घोकी । वश व्हावें जेणें लोकीं ॥2॥ तुका ह्मणे थीत । नागवला नव्हे हित॥3॥ 2114 विठ्ठल मुिHदाता । नव्हे मरो हें बोलता ॥1॥ मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥ हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥2॥ सुना काळतोंडा । जो या देवा ह्मणे धोंडा॥3॥ अहं ह्मणे ब्रह्म । नेणे भHीचें तें वर्म ॥4॥ तुका ह्मणे क्षण। नको तयाचें दर्षण ॥5॥ 2115 यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥1॥ अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥ काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥2॥ द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥3॥ तुका ह्मणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥4॥ 2116 न कळतां कोणीं मोडियेलें व्रत । तया प्रायिश्चत्त चाले कांहीं ॥1॥ जाणतियां वज्रलेप जाले थोर । तयांस अघोर कुंभपाक ॥ध्रु.॥ आतां जरी कोणी नाइके सांगतां । तया शिकवितां तें चि पाप ॥2॥ काय करूं मज देवें बोलविलें । माझें खोळंबिलें काय होतें ॥3॥ तुका ह्मणे जना पाहा विचारूनी । सुख वाटे मनीं तें चि करा ॥4॥ 2117 वाचे विठ्ठल नाहीं । तो चि प्रेतरूप पाहीं ॥1॥ धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥ न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥2॥ जातां कांटाळे देउळा । तो चि सुना मुखकाळा ॥3॥ हरिभHीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥4॥ तुका ह्मणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥5॥ 2118 तारिलीं बहुतें चुकवूनि घात । नाम हें अमृत स्वीकारितां॥1॥ नेणतां सायास शुद्ध आचरण । यातीकुळहीन नामासाटीं ॥ध्रु.॥ जन्म नांव धरी भHीच्या पाळणा । आकार कारणा या च साटीं ॥2॥ असुरीं दाटली पाप होतां फार । मग फेडी भार पृथिवीचा ॥3॥ तुका ह्मणे देव भHपण सार । कवतुक- वेव्हार तयासाटीं ॥4॥ 2119 याचिया आधारें राहिलों नििंश्चत । ठेवूनियां चित्त पायीं सुखें ॥1॥ माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंखिलीं । ह्मणऊनि लागली यास चिंता ॥2॥ मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंिद्रयें तापटीं फांकों नेदी ॥3॥ तुका ह्मणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥4॥ 2120 उभाउभी फळ । अंगीं मंत्राचे या बळ ॥1॥ ह्मणा विठ्ठल विठ्ठल । गोड आणि स्वल्प बोल ॥ध्रु.॥ किळकाळाची बाधा । नव्हे उच्चारितां सदा ॥2॥ तुका ह्मणे रोग । वारे भवाऐसा भोग ॥3॥ 2121 जैसा अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥1॥ काय वाउगी घसघस । आह्मी विठोबाचे दास ॥ध्रु.॥ आह्मी जाणों एका देवा । जैसी तैसी करूं सेवा ॥2॥ तुका ह्मणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥3॥ 2122 नव जातां घरा । आह्मी कोणाच्या दातारा ॥1॥ कां हे छळूं येती लोक । दाट बळें चि कंटक ॥ध्रु.॥ नाहीं आह्मी खात। कांहीं कोणाचें लागत ॥2॥ कळे तैसी सेवा । तुका ह्मणे करूं देवा ॥3॥ 2123 मोहरोनी चित्ता । आणूं हळूं चि वरि हिता ॥1॥ तों हे पडती आघात । खोडी काढिती पंडित ॥ध्रु.॥ संवसारा भेणें । कांहीं उसंती तों पेणें ॥2॥ एखादिया भावें । तुका ह्मणे जवळी यावें ॥3॥ 2124 काय जाणों वेद । आह्मी आगमाचे भेद ॥1॥ एक रूप तुझें मनीं । धरूनि राहिलों चिंतनी ॥ध्रु.॥ कोठें अधिकार । नाहीं रानट विचार ॥2॥ तुका ह्मणे दीना । नुपेक्षावें नारायणा॥3॥ 2125 धर्माचे पाळण । करणें पाषांड खंडण ॥1॥ हें चि आह्मां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥ध्रु.॥ तीक्षण उत्तरें । हातीं घेउनि बाण फिरें ॥2॥ नाहीं भीड भार । तुका ह्मणे साना थोर॥3॥ 2126 निवडावें खडे । तरी दळण वोजें घडे ॥1॥ नाहीं तरि नासोनि जाय । कारण आळस उरे हाय ॥ध्रु.॥ निवडावें तन। सेतीं करावें राखण ॥2॥ तुका ह्मणे नीत । न विचारितां नव्हे हित॥3॥ 2127 दुर्जनाचा मान । सुखें करावा खंडण ॥1॥ लात हाणोनियां वारी । गुंड वाट शुद्ध करी ॥ध्रु.॥ बहुतां पीडी खळ । त्याचा धरावा विटाळ ॥2॥ तुका ह्मणे नखें । काढुनि टाकिजेती सुखें ॥3॥ 2128 नका धरूं कोणी । राग वचनाचा मनीं ॥1॥ येथें बहुतांचें हित । शुद्ध करोनि राखा चित्त ॥ध्रु.॥ नाहीं केली निंदा । आह्मीं दुसिलेंसे भेदा ॥2॥ तुका ह्मणे मज । येणें विण काय काज॥3॥ 2129 कांहीं जडभारी । पडतां ते अवश्वरी ॥1॥ तुज आठवावे पाय । आह्मीं मोकलूनि धाय ॥ध्रु.॥ तान पीडी भूक । शीत उष्ण वाटे दुःख ॥2॥ तुका ह्मणे लाड । तेथें पुरे माझें कोड॥3॥ 2130 होउनि कृपाळ । भार घेतला सकळ ॥1॥ तूं चि चालविसी माझें । भार सकळ ही ओझें ॥ध्रु.॥ देह तुझ्या पायीं । ठेवुनि झालों उतराइऩ ॥2॥ कायावाचामनें । तुका ह्मणे दुजें नेणें॥3॥ 2131 आतां होइप माझे बुद्धीचा जनिता । अवरावें चित्ता पांडुरंगा ॥1॥ येथूनियां कोठें न वजें बाहेरी । ऐसें मज धरीं सत्ताबळें ॥ध्रु.॥ अनावर गुण बहुतां जातींचे । न बोलावें वाचे ऐसें करीं ॥2॥ तुका ह्मणे हित कोणिये जातीचें । तुज ठावें साचें मायबापा ॥3॥ 2132 नित्य मनासी करितों विचार । तों हें अनावर विषयलोभी॥1॥ आतां मज राखें आपुलिया बळें । न देखें हे जाळें उगवतां ॥ध्रु.॥ सांपडलों गळीं नाहीं त्याची सत्ता । उगळी मागुता घेतला तो ॥2॥ तुका ह्मणे मी तों अYाान चि आहें । परि तुझी पाहें वास देवा ॥3॥ 2133 दुर्बळाचे हातीं सांपडलें धन । करितां जतन नये त्यासी ॥1॥ तैसी परी मज झाली नारायणा । योगक्षेम जाणां तुह्मी आतां ॥ध्रु.॥ खातां लेतां नये मिरवितां वरि । राजा दंड करी जनराग ॥2॥ तुका ह्मणे मग तळमळ उरे । देखिलें तें झुरे पाहावया ॥3॥ 2134 मागें जैसा होता माझे अंगीं भाव । तैसा एक ठाव नाहीं आतां ॥1॥ ऐसें गोही माझें मन मजपाशीं । तुटी मुदलेंसी दिसे पुढें ॥ध्रु.॥ पुढिलांचे मना आणि गुणदोष । पूज्य आपणांस करावया ॥2॥ तुका ह्मणे जाली कोंबडएाची परी । पुढें चि उकरी लाभ नेणें ॥3॥ 2135 किती तुजपाशीं देऊं परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा॥1॥ आतां माझें हातीं देइप हित । करीं माझें चित्त समाधान॥ध्रु.॥ राग आला तरी कापूं नये मान । बाळा मायेविण कोण दुजें ॥2॥ तुका ह्मणे ऐसा होइऩल लौकिक । मागे बाळ भीक समर्थाचें ॥3॥ 2136 लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥1॥ चुकलिया काम मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥ पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥2॥ तुका ह्मणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥3॥ 2137 पुढिलिया सुखें निंब देतां भले । बहुत वारलें होय दुःख ॥1॥ हें तों वर्म असे माउलीचे हातीं । हाणी मारी प्रीती हितासाठीं ॥ध्रु.॥ खेळतां विसरे भूक तान घर । धरूनियां कर आणी बळें ॥2॥ तुका ह्मणे पाळी तोंडऴिचया घांसें । उदार सर्वस्वें सर्वकाळ ॥3॥ 2138 आतां गुण दोष काय विचारिसी । मी तों आहे रासी पातकांची ॥1॥ पतितपावनासवें समागम । अपुलाला धर्म चालवीजे॥ध्रु.॥ घनघायें भेटी लोखंडपरिसा । तरी अनारिसा न पालटे ॥2॥ तुका ह्मणे माती कोण पुसे फुका । कस्तुरीच्या तुका समागमें ॥3॥ 2139 कृपावंता दुजें नाहीं तुह्मां पोटीं । लाडें बोलें गोठी सुख मातें ॥1॥ घेउनि भातुकें लागसील पाठी । लाविसील ओंठीं ब्रह्मरस ॥ध्रु.॥ आपुलिये पांख घालिसी पाखर । उदार मजवर कृपाळू तूं ॥2॥ तुका ह्मणे आह्मांकारणें गोविंदा । वागविसी गदा सुदर्शन ॥3॥ 2140 पािळलों पोसिलों जन्मजन्मांतरीं । वागविलों करीं धरोनियां ॥1॥ आतां काय माझा घडेल अव्हेर । मागें बहु दूर वागविलें ॥ध्रु.॥ नेदी वारा अंगीं लागों आघाताचा । घेतला ठायींचा भार माथां ॥2॥ तुका ह्मणे बोल करितों आवडी । अविट ते चि गोडी अंतरींची ॥3॥ 2141 पांडुरंगा कांहीं आइकावी मात । न करावें मुH आतां मज ॥1॥ जन्मांतरें मज तैसीं देइप देवा । जेणें चरणसेवा घडे तुझी ॥ध्रु.॥ वाखाणीन कीर्ती आपुलिया मुखें । नाचेन मी सुखें तुजपुढें ॥2॥ करूनि कामारी दास दीनाहुनी । आपुला अंगणीं ठाव मज ॥3॥ तुका ह्मणे आह्मी मृत्युलोकीं भले । तुझे चि अंखिले पांडुरंगा ॥4॥ 2142 माझे अंतरींचें तो चि जाणे एक । वैकुंठनायक पांडुरंग ॥1॥ जीव भाव त्याचे ठेवियेला पायीं । मज चिंता नाहीं कवणेविशीं ॥ध्रु.॥ सुखसमारंभें संतसमागमें । गाऊं वाचे नाम विठोबाचें ॥2॥ गातां पुण्य होय आइकतां लाभ । संसारबंद तुटतील ॥3॥ तुका ह्मणे जीव तयासी विकिला । आणीक विठ्ठलाविण नेणें ॥4॥ 2143 कथा दुःख हरी कथा मुH करी । कथा याची बरी विठोबाची ॥1॥ कथा पाप नासी उद्धरिले दोषी । समाधि कथेसी मूढजना ॥ध्रु.॥ कथा तप ध्यान कथा अनुष्ठान । अमृत हे पान हरिकथा ॥2॥ कथा मंत्रजप कथा हरी ताप । कथाकाळी कांप किळकाळासी ॥3॥ तुका ह्मणे कथा देवाचें ही ध्यान । समाधि लागोन उभा तेथें ॥4॥ ॥13॥ 2144 काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥1॥ तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥ करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥2॥ तुका ह्मणे देवा । माझें हृदय वसवा ॥3॥ 2145 भला ह्मणे जन । परि नाहीं समाधान ॥1॥ माझें तळमळी चित्त । अंतरलें दिसे हित ॥ध्रु.॥ कृपेचा आधार । नाहीं दंभ जाला भार ॥2॥ तुका ह्मणे कृपे । अंतराय कोण्या पापें ॥3॥ 2146 शिकविले बोल । बोलें तैसी नाहीं ओल ॥1॥ आतां देवा संदेह नाहीं । वांयां गेलों यासी कांहीं ॥ध्रु.॥ एकांताचा वास । नाहीं संकल्पाचा नास ॥2॥ बुिद्ध नाहीं िस्थर । तुका ह्मणे शब्दा धीर ॥3॥ 2147 उचिताचा दाता । कृपावंता तूं अनंता ॥1॥ कां रे न घालिसी धांव । तुझें उच्चारितां नांव ॥ध्रु.॥ काय बळयुिH । नाहीं तुझे अंगीं शिH ॥2॥ तुका ह्मणे तूं विश्वंभर । ओस माझें कां अंतर ॥3॥ 2148 वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥1॥ माझी शिH नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥ आह्मां ओढी काळ। तुझें क्षीण झालें बळ ॥2॥ तुका ह्मणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥3॥ 2149 आतां घेइप माझें । भार सकळ ही ओझें ॥1॥ काय करिसी होइऩ वाड । आलों पोटासीं दगड ॥ध्रु.॥ तूं चि डोळे वाती। होइऩ दीपक सांगातीं ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । विचाराया चाड नाहीं॥3॥ 2150 असोत हे बोल । अवघें तूं चि भांडवल ॥1॥ माझा मायबाप देवा । सज्जन सोयरा केशवा ॥ध्रु.॥ गािळयेले भेद । सारियेले वादावाद ॥2॥ तुका ह्मणे मधीं । आतां न पडे उपाधि॥3॥ 2151 करीन कोल्हाळ । आतां हा चि सर्वकाळ ॥1॥ आतां ये वो माझे आइऩ । देइप भातुकें विठाइऩ ॥ध्रु.॥ उपायासी नाम। दिलें याचें पुढें क्षेम ॥2॥ बीज आणि फळ । हें चि तुका ह्मणे मूळ॥3॥ 2152 धनासीं च धन । करी आपण जतन ॥1॥ तुज आळवितां गोडी । पांडुरंगा खरी जोडी ॥ध्रु.॥ जेविल्याचें खरें । वरी उमटे ढेंकरें ॥2॥ तुका ह्मणे धाय । तेथें कोठें उरे हाय ॥3॥ 2153 अनुभवा आलें । माझें चित्तींचें क्षरलें ॥1॥ असे जवळी अंतर । फिरे आवडीच्या फेरें ॥ध्रु.॥ खादलें चि वाटे । खावें भेटलें चि भेटे ॥2॥ तुका ह्मणे उभें । आह्मी राखियेलें लोभें॥3॥ ॥10॥ 2154 पोटीं शूळ अंगीं उटी चंदनाची । आवडी सुखाची कोण तया ॥1॥ तैसें मज कां गा केलें पंढरिराया । लौकिक हा वांयां वाढविला ॥ध्रु.॥ ज्वरिलियापुढें वाढिलीं मिष्टान्नें । काय चवी तेणें घ्यावी त्याची ॥2॥ तुका ह्मणे मढें शृंगारिलें वरी । ते चि जाली परी मज देवा ॥3॥ 2155 बेगडाचा रंग राहे कोण काळ । अंगें हें पितळ न देखतां ॥1॥ माझें चित्त मज जवळीच गो ही । तुझी मज नाहीं भेटी ऐसें ॥ध्रु.॥ दासीसुतां नाहीं पितियाचा ठाव । अवघें चि वाव सोंग त्याचें ॥2॥ तुका ह्मणे माझी केली विटंबना । अनुभवें जना येइऩल कळों ॥3॥ 2156 मजपुढें नाहीं आणीक बोलता । ऐसें कांहीं चित्ता वाटतसें ॥1॥ याचा कांहीं तुह्मीं देखा परिहार । सर्वYा उदार पांडुरंगा ॥ध्रु.॥ काम क्रोध नाहीं सांडिलें आसन । राहिले वसोन देहामध्यें ॥2॥ तुका ह्मणे आतां जालों उतराइऩ । कळों यावें पायीं निरोपिलें ॥3॥ 2157 सावित्रीची विटंबण । रांडपण करीतसे ॥1॥ काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥ कुबिर नांव मोळी वाहे। कैसी पाहें फजिती ॥2॥ तुका ह्मणे ठुणगुण देखें । उगीं मूर्ख काुंफ्दतां ॥3॥ 2158 न गमेसी जाली दिवसरजनी । राहिलों लाजोनि नो बोलावें ॥1॥ रुचिविण काय शब्द वा†या माप । अनादरें कोप येत असे ॥ध्रु.॥ आपुलिया रडे आपुलें चि मन । दाटे समाधान पावतसें॥2॥ तुका ह्मणे तुह्मी असा जी जाणते । काय करूं रिते वादावाद ॥3॥ 2159 मेल्यावरि मोक्ष संसारसंबंधें । आरालिया बधे ठेवा आह्मां ॥1॥ वागवीत संदेह राहों कोठवरी । मग काय थोरी सेवकाची ॥ध्रु.॥ गाणें गीत आह्मां नाचणें आनंदें । प्रेम कोठें भेदें अंगा येतें ॥2॥ तुका ह्मणे किती सांगावे दृष्टांत । नसतां तूं अनंत सानकुळ ॥3॥ 2160 एकाएकीं आतां असावेंसें वाटे । तरि च हे खोटे चाळे केले ॥1॥ वाजवूनि तोंड घातलों बाहेरी । कुल्प करुनी दारीं माजी वसा ॥ध्रु.॥ उजेडाचा केला दाटोनि अंधार । सवें हुद्देदार चेष्टाविला ॥2॥ तुका ह्मणे भय होतें तों चि वरी । होती कांहीं उरी स्वामिसेवा ॥3॥ 2161 काय नव्हेसी तूं एक । देखों कासया पृथक ॥1॥ मुंग्या कैंचे मुंगळे । नटनाटए तुझे चाळे ॥ध्रु.॥ जाली तरी मर्यादा। किंवा त्रासावें गोविंदा ॥2॥ तुका ह्मणे साचा । कोठें जासी हृदयींचा॥3॥ 2162 कां जी वाढविलें । न लगतां हें उगलें ॥1॥ आतां मानितां कांटाळा । भोवतीं मिळालिया बाळा ॥ध्रु.॥ लावूनियां सवे। पळतां दिसाल बरवे ॥2॥ तुका ह्मणे बापा । येतां न कळा चि रूपा ॥3॥ ॥3॥ 2163 क्षुधेलिया अन्न । द्यावें पात्र न विचारून ॥1॥ धर्म आहे वर्मा अंगीं । कळलें पाहिजे प्रसंगीं ॥ध्रु.॥ द्रव्य आणि कन्या। येथें कुळ कर्म शोधण्या ॥2॥ तुका ह्मणे पुण्य गांठी । तरि च उचितासी भेटी ॥3॥ 2164 वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥1॥ बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥ फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥2॥ तुका ह्मणे मान । लवणासारिखें लवण॥3॥ 2165 मज नाहीं धीर । तुह्मी न करा अंगीकार ॥1॥ ऐसें पडिलें विषम । बळी देवाहूनि कर्म ॥ध्रु.॥ चालों नेणें वाट । केल्या न पवा बोभाट ॥2॥ वेचों नेणे जीवें । तुका उदास धरिला देवें॥3॥ 2166 तळमळी चित्त दर्शनाची आशा । बहु जगदीशा करुणा केली ॥1॥ वचनीं च संत पावले स्वरूप । माझें नेदी पाप योगा येऊं ॥ध्रु.॥ वेठीऐसा करीं भिHवेवसाव । न पवे चि जीव समाधान ॥2॥ तुका ह्मणे कइप देसील विसांवा । पांडुरंगे धांवा घेतें मन ॥3॥ ॥4॥ 2167 हागतां ही खोडी । चळण मोडवितें काडी ॥1॥ ऐसे अनावर गुण । आवरावे काय ह्मुण ॥ध्रु.॥ नाहीं जरी संग । तरी बडबडविती रंग ॥2॥ तुका ह्मणे देवा । तुमची न घडे चि सेवा ॥3॥ ॥1॥ 2168 देह निरसे तरी । बोलावया नुरे उरी ॥1॥ येर वाचेचें वाग्जाळ । अळंकारापुरते बोल ॥ध्रु.॥ काचें तरी कढे । जाती ऐसें चित्त ओढे ॥2॥ विष्णुदास तुका । पूर्ण धनी जाणे चुका॥3॥ 2169 खोटएाचा विकरा । येथें नव्हे कांच हिरा ॥1॥ काय दावायाचें काम । उगा च वाढवावा श्रम ॥ध्रु.॥ परीक्षकाविण । मिरवों जाणों तें तें हीण ॥2॥ तुका पायां पडे । वाद पुरे हे झगडे॥3॥ ॥2॥ 2170 पंढरीस घडे अतित्यायें मृत्य । तो जाय पतित अधःपाता ॥1॥ दुराचारें मोक्ष सुखाचे वसति । भोळी बाळमूतिऩ पांडुरंग ॥ध्रु.॥ केला न सहावे तीर्थउपवास । कथेविण दोषसाधन तें ॥2॥ कालियापें भेद मानितां निवडे । श्रोत्रियांसी जोडे आंतेजेता॥3॥ माहेरीं सलज्ज ते जाणा सिंदळी । कािळमा काजळी पावविते ॥4॥ तुका ह्मणे तेथें विश्वास जतन । पुरे भीमास्नान सम पाय ॥5॥ ॥1॥ 2171 चातुर्याच्या अनंतकळा । सत्या विरळा जाणत ॥1॥ हांसत्यासवें हांसे जन । रडतां भिन्न पालटे ॥ध्रु.॥ जळो ऐसे वांजट बोल । गुणां मोल भूस मिथ्या ॥2॥ तुका ह्मणे अंधऑयाऐसें । वोंगळ पिसें कौतुक ॥3॥ 2172 नयो वाचे अनुचित वाणी । नसो मनीं कुडी बुिद्ध॥1॥ ऐसें मागा अरे जना । नारायणा विनवूनि ॥ध्रु.॥ कामक्रोधां पडो चिरा । ऐसा बरा सायास ॥2॥ तुका ह्मणे नानाछंदें । या विनोदें न पडावें ॥3॥ 2173 माझिया देहाची मज नाहीं चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥1॥ इिच्छतां ते मान मागा देवापासीं । आसा संचितासी गुंपले हो ॥ध्रु.॥ देह आह्मी केला भोगाचे सांभाळीं । राहिलों निराळीं मानामानां ॥2॥ तुका ह्मणे कोणें वेचावें वचन । नसतां तो सीण वाढवावा ॥3॥ 2174 धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा ॥1॥ ह्मणऊनि असट मन । नका खुण सांगतों ॥ध्रु.॥ आविसापासी अवघें वर्म । सोस श्रम पाववी ॥2॥ तुका ह्मणे बीज न्यावें । तेथें यावें फळानें ॥3॥ ॥4॥ 2175 वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका॥1॥ ताकिर्याचें अंग आपणा पारिखें । माजि†यासारिखें वाइऩचाळे ॥ध्रु.॥ माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खपर याचे नावें ॥2॥ तुका ह्मणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥3॥ 2176 कस्तुरीचें अंगीं मीनली मृित्तका । मग वेगळी कां येइऩल लेखूं ॥1॥ तयापरि भेद नाहीं देवभHीं । संदेहाच्या युिH सरों द्याव्या ॥ध्रु.॥ इंधनें ते आगी संयोगाच्या गुणें । सागरा दरुषणें वाहाळ तों चि ॥2॥ तुका ह्मणे माझें साक्षीचें वचन । येथें तों कारण शुद्ध भाव ॥3॥ 2177 भिH तें नमन वैराग्य तो त्याग । Yाान ब्रह्मीं भोग ब्रह्मतनु ॥1॥ देहाच्या निरसनें पाविजे या ठाया । माझी ऐसी काया जंव नव्हे ॥ध्रु.॥ उदक अिग्न धान्य जाल्या घडे पाक । एकाविण एक कामा नये ॥2॥ तुका ह्मणे मज केले ते चांचणी । बडबडीची वाणी अथवा सत्य ॥3॥ ॥3॥ 2178 श्रीसंतांचिया माथा चरणांवरी । साष्टांग हें करीं दंडवत ॥1॥ विश्रांती पावलों सांभाळउत्तरीं । वाढलें अंतरीं प्रेमसुखें॥ध्रु.॥ डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥2॥ तुका ह्मणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा वोडवला ॥3॥ 2179 नेणों काय नाड । आला उचित काळा आड ॥1॥ नाहीं जाली संतभेटी । येवढी हानी काय मोठी ॥ध्रु.॥ सहज पायांपासीं । जवळी पावलिया ऐसी ॥2॥ चुकी जाली आतां काय। तुका ह्मणे उरली हाय ॥3॥ 2180 आणीक कांहीं नेणें । असें पायांच्या चिंतनें ॥1॥ माझा न व्हावा विसर । नाहीं आणीक आधार ॥ध्रु.॥ भांडवल सेवा। हा चि ठेवियेला ठेवा ॥2॥ करीं मानभावा । तुका विनंती करी देवा ॥3॥ 2181 आरुश माझी वाणी बोबडीं उत्तरें । केली ते लेकुरें सलगी पायीं ॥1॥ करावें कवतुक संतीं मायबापीं । जीवन देउनि रोपीं विस्तारिजे ॥ध्रु.॥ आधारें वदली प्रसादाची वाणी । उिच्छष्टसेवणी तुमचिया ॥2॥ तुका ह्मणे हे चि करितों विनंती । मागोनि पुढती सेवादान ॥3॥ ॥4॥ 2182 पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृित्त या ॥1॥ पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥ जळो ऐसी िब्रदावळी। भाटवोळीपणाची ॥2॥ तुका ह्मणे पाहों डोळां । अवकळा नये हे॥3॥ 2183 वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥1॥ जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥ अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥2॥ तुका ह्मणे नरका जावें । हा चि जीवें व्यापार ॥3॥ 2184 सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥1॥ स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥ काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥2॥ तुका ह्मणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥3॥ 2185 प्रायिश्चत्तें देतो तुका । जातो लोकां सकळां ॥1॥ धरितील ते तरती मनीं । जाती घाणी वांयां त्या ॥ध्रु.॥ निग्रहअनुग्रहाचे ठाय । देतो घाय पाहोनि ॥2॥ तुका जाला नरसिंहीं । भय नाहीं कृपेनें ॥3॥ ॥4॥ 2186 दुर्जनाचें अंग अवघें चि सरळ । नकाऩचा कोथळ सांटवण ॥1॥ खाय अमंगळ बोले अमंगळ । उठवी कपाळ संघष्टणें ॥ध्रु.॥ सर्पा मंत्र चाले धरावया हातीं । खळाची ते जाती निखळे चि ॥2॥ तुका ह्मणे कांहीं न साहे उपमा । आणीक अधमा वोखटएाची ॥3॥ 2187 ऐका जी संतजन । सादर मन करूनि ॥1॥ सकळांचें सार एक । कंटक ते तजावे ॥ध्रु.॥ विशेषता कांद्याहूनि । सेवित्या घाणी आगळी ॥2॥ तुका ह्मणे ज्याची जोडी । ते परवडी बैसीजे॥3॥ 2188 आYाा पाळुनियां असें एकसरें । तुमचीं उत्तरें संतांचीं हीं ॥1॥ भागवूनि देह ठेवियेला पायीं । चरणावरि डोइऩ येथुनें चि॥ध्रु.॥ येणें जाणें हें तों उपाधीचे मूळ । पूजा ते सकळ अकर्तव्य ॥2॥ तुका ह्मणे असें चरणींचा रज । पदीं च सहज जेथें तेथें ॥3॥ ॥3॥ 2189 न संडावा ठाव । ऐसा निश्चयाचा भाव ॥1॥ आतां पुरे पुन्हा यात्रा । हें चि सारूनि सर्वत्रा ॥ध्रु.॥ संनिध चि सेवा । असों करुनियां देवा ॥2॥ आYोच्या पाळणें । असें तुका संतां ह्मणे॥3॥ 2190 उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥1॥ आह्मां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥ प्राधीन तें जिणें । केलें सत्ता नारायणें ॥2॥ तुका ह्मणे जाणें पाय । खुंटले आणीक उपाय ॥3॥ 2191 गोविंदावांचोनि वदे ज्याची वाणी । हगवण घाणी पिटपिट ते ॥1॥ मस्तक सांडूनि सिसफूल गुडघां । चार तो अवघा बावऑयाचा ॥ध्रु.॥ अंगभूत ह्मूण पूजितो वाहाणा । ह्मणतां शाहाणा येइल कैसा ॥2॥ तुका ह्मणे वेश्या सांगे सवासिणी । इतर पूजनीं भाव तैसा ॥3॥ 2192 कुत†याऐसें ज्याचें जिणें । संग कोणी न करीजे॥1॥ जाय तिकडे हाडहाडी । गो†हवाडी च सोइरीं ॥ध्रु.॥ अवगुणांचा त्याग नाहीं । खवळे पाहीं उपदेशें ॥2॥ तुका ह्मणे कैंची लवी । ठेंग्या केवीं अंकुर ॥3॥ 2193 सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥1॥ बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥ सेविलिया निःकामबुद्धी। मदें शुद्धी सांडवी ॥2॥ त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥3॥ ॥5॥ 2194 उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥1॥ असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥ दुस†यामध्यें कोण मिळे । छंद चाळे बहु मतें ॥2॥ एकाएकीं आतां तुका । लौकिका या बाहेरी ॥3॥ 2195 मी तें मी तूं तें तूं । कुंकुड हें लाडसी ॥1॥ वचनासी पडो तुटी । पोटींचें पोटीं राखावें ॥ध्रु.॥ तेथील तेथें येथील येथें । वेगऑया कुंथे कोण भारें ॥2॥ याचें यास त्याचें त्यास । तुक्यानें कास घातली ॥3॥ ॥2॥ 2196 लाडाच्या उत्तरीं वाढविती कलहे । हा तो अमंगळ जातिगुण ॥1॥ तमाचे शरीरीं विटाळ चि वसे । विचाराचा नसे लेश तो ही ॥ध्रु.॥ कवतुकें घ्यावे लेंकराचे बोल । साहिलिया मोल ऐसें नाहीं ॥2॥ तुका ह्मणे काय उपदेश खळा । न्हाउनि काउळा खतें धुंडी ॥3॥ 2197 आतां मज देवा । इचे हातींचें सोडवा ॥1॥ पाठी लागलीसे लांसी । इच्छा जिते जैसी तैसी ॥ध्रु.॥ फेडा आतां पांग। अंगीं लपवुनी अंग ॥2॥ दुजें नेणें तुका । कांहीं तुह्मासी ठाउका॥3॥ 2198 बहु वाटे भये । माझे उडी घाला दये ॥1॥ फांसा गुंतलों लिगाडीं । न चले बळ चरफडी ॥ध्रु.॥ कुंटित चि युिH । माझ्या जाल्या सर्व शिH ॥2॥ तुका ह्मणे देवा । काममोहें केला गोवा ॥3॥ ॥3॥ 2199 विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळ चि सखें वोंगळाचें ॥1॥ नये पाहों कांहीं गो†हवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥ भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥2॥ तुका ह्मणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥3॥ ॥1॥ 2200 चावळलें काय न करी बडबड । न ह्मणे फिकें गोड भुकेलें तें ॥1॥ उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥ गरज्या न कळे आपुलिया चाडा । करावी ते पीडा कोणा काइऩ ॥2॥ तुका ह्मणे भोग भोगितील भोगें । संचित तें जोगें आहे कोणा ॥3॥ 2201 आपुला तो देह आह्मां उपेक्षीत । कोठें जाऊं हित सांगों कोणा ॥1॥ कोण नाहीं दक्ष करितां संसार । आह्मीं हा विचार वमन केला ॥ध्रु.॥ नाहीं या धरीत जीवित्वाची चाड । कोठें करूं कोड आणिकांचें ॥2॥ तुका ह्मणे असों चिंतोनियां देवा । मी माझें हा हेवा सारूनियां ॥3॥ ॥2॥ 2202 चाकरीवांचून । खाणें अनुचित वेतन ॥1॥ धणी काढोनियां निजा । करील ये कामाची पूजा ॥ध्रु.॥ उचितावेगळें । अभिलाषें तोंड काळें ॥2॥ सांगे तरी तुका । पाहा लाज नाहीं लोकां ॥3॥ 2203 बरें सावधान । राहावें समय राखोन ॥1॥ नाहीं सारखिया वेळा । अवघ्या पावतां अवकळा ॥ध्रु.॥ लाभ अथवा हानी । थोडएामध्यें च भोवनी ॥2॥ तुका ह्मणे राखा । आपणा नाहीं तोंचि वाखा ॥3॥ ॥2॥ 2204 काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥1॥ जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥ घालीं भलते ठायीं हात । होती शिव्या बैस लात ॥2॥ आदि अंतीं तुका । सांगे न कळे झाला चुका ॥3॥ 2205 धर्म तो न कळे । काय झांकितील डोळे ॥1॥ जीव भ्रमले या कामें । कैसीं कळों येती वर्में ॥ध्रु.॥ विषयांचा माज । कांहीं धरूं नेदी लाज ॥2॥ तुका ह्मणे लांसी । माया नाचविते कैसी ॥3॥ ॥2॥ 2206 दुर्जनाची जोडी । सज्जनाचे खेंटर तोडी ॥1॥ पाहे निमित्य तें उणें । धांवे छळावया सुनें ॥ध्रु.॥ न ह्मणे रामराम । मनें वाचे हें चि काम ॥2॥ तुका ह्मणे भागा । आली निंदा करी मागा॥3॥ 2207 शादीचें तें सोंग । संपादितां जरा वेंग ॥1॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥ दिसतें तें लोपी । झिंज्या बोडुनियां पापी ॥2॥ सिंदळी त्या सती । तुका ह्मणे थुंका घेती ॥3॥ ॥2॥ 2208 भHा ह्मणऊनि वंचावें जीवें । तेणें शेण खावें काशासाटीं ॥1॥ नासिले अडबंद कौपीन ते माळा । अडचण राउळामाजी केली ॥ध्रु.॥ अंगीकारिले सेवे अंतराय । तया जाला न्याय खापराचा ॥2॥ तुका ह्मणे कोठें तगों येती घाणीं । आहाच ही मनीं अधीरता ॥3॥ ॥1॥ 2209 गयाळाचें काम हिताचा आवारा । लाज फजितखोरा असत नाहीं ॥1॥ चित्ता न मिळे तें डोळां सलों येतें । असावें परतें जवळूनि ॥ध्रु.॥ न करावा संग न बोलावी मात । सावधान चित्त नाहीं त्यासी ॥2॥ तुका ह्मणे दुःख देतील माकडें । घालिती सांकडें उफराटें ॥3॥ 2210 बहु बरें एकाएकीं । संग चुकी करावा ॥1॥ ऐसें बरें जालें ठावें । अनुभवें आपुल्या ॥ध्रु.॥ सांगावें तें काम मना । सलगी जना नेदावी ॥2॥ तुका ह्मणे निघे अगी । दुजे संगीं आतळतां ॥3॥ ॥2॥ अलकापुरीं स्वामी कीर्तनास उभे राहिले तेव्हां कवित्वाचा निषेध करून लोक बोलिले कीं कवित्व बुडवणें तेव्हां कवित्व बुडवून पांच दिवस होते ॥ लोकांनीं फार पीडा केली कीं संसारही नाहीं व परमार्थही बुडविला आणीक कोणी असतें तें जीव देतें मग निद्रा केली ते अभंग ॥ 20 ॥ 2211 भूतबाधा आह्मां घरीं । हें तों आश्चर्य गा हरी ॥1॥ जाला भHीचा कळस । आले वस्तीस दोष ॥ध्रु.॥ जागरणाचें फळ । दिली जोडोनि तळमळ ॥2॥ तुका ह्मणे देवा । आहाच कळों आली सेवा ॥3॥ 2212 नाहीं जों वेचलों जिवाचिया त्यागें । तोंवरी वाउगें काय बोलों ॥1॥ जाणिवलें आतां करीं ये उदेश । जोडी किंवा नाश तुमची जीवें ॥ध्रु.॥ ठायींचे चि आलें होतें ऐसें मना । जावें ऐसें वना दृढ जालें ॥2॥ तुका ह्मणे मग वेचीन उत्तरें । उद्धेसिलें खरें जाल्यावरी ॥3॥ 2213 करूं कवि काय आतां नाही लाज । मज भHराज हांसतील ॥1॥ आतां आला एका निवाडएाचा दिस । सत्याविण रस विरसला ॥ध्रु.॥ अनुभवाविण कोण करी पाप । रिते चि संकल्प लाजलावे ॥2॥ तुका ह्मणे आतां न धरवे धीर । नव्हे जीव िस्थर माझा मज ॥3॥ 2214 नाहीं आइकत तुह्मी माझे बोल । कासया हें फोल उपणूं भूस ॥1॥ येसी तें करीन बैसलिया ठाया । तूं चि बुझावया जवळी देवा ॥ध्रु.॥ करावे ते केले सकळ उपाय । आतां पाहों काय अझुनि वास ॥2॥ तुका ह्मणे आला आYोसी सेवट । होऊनियां नीट पायां पडों ॥3॥ 2215 नव्हे तुह्मां सरी । येवढें कारण मुरारी ॥1॥ मग जैसा तैसा काळ । दाट सारावा पातळ ॥ध्रु.॥ स्वामींचें तें सांडें । पुत्र होतां काळतोंडें ॥2॥ शब्दा नाहीं रुची । मग कोठें तुका वेची॥3॥ 2216 केल्यापुरती आळी । कांहीं होते टाळाटाळी ॥1॥ सत्यसंकल्पाचें फळ । होतां न दिसे चि बळ ॥ध्रु.॥ दळणांच्या ओव्या । रित्या खरें मापें घ्याव्या ॥2॥ जातीं उखळें चाटूं । तुका ह्मणे राज्य घाटूं ॥3॥ 2217 आतां नेम जाला । या च कळसीं विठ्ठला ॥1॥ हातीं न धरीं लेखणी । काय भुसकट ते वाणी ॥ध्रु.॥ जाणें तेणें काळ । उरला सारीन सकळ ॥2॥ तुका ह्मणे घाटी । चाटू कोरडा शेवटीं ॥3॥ 2218 पावावे संतोष । तुह्मीं यासाटीं सायास ॥1॥ करीं आवडी वचनें । पालटूनि क्षणक्षणें ॥ध्रु.॥ द्यावें अभयदान । भुमीन पाडावें वचन ॥2॥ तुका ह्मणे परस्परें । कांहीं वाढवीं उत्तरें ॥3॥ 2219 बोलतां वचन असा पाठमोरे । मज भाव बरे कळों आले ॥1॥ मागतिलें नये अरुचीनें हातां । नाहीं वरी सत्ता आदराची॥ध्रु.॥ समाधानासाटीं लाविलासे कान । चोरलें तें मन दिसतसां ॥2॥ तुका ह्मणे आह्मां तुमचे चि फंद । वरदळ छंद कळों येती ॥3॥ 2220 काशासाटीं बैसों करूनियां हाट । वाउगा बोभाट डांगोरा हा ॥1॥ काय आलें एका जिवाच्या उद्धारें । पावशी उच्चारें काय हो तें ॥ध्रु.॥ नेदी पट परी अन्नें तों न मरी । आपुलिये थोरीसाटीं राजा ॥2॥ तुका ह्मणे आतां अव्हेरिलें तरी । मग कोण करी दुकान हा ॥3॥ 2221 माझा मज नाहीं । आला उबेग तो कांहीं ॥1॥ तुमच्या नामाची जतन । नव्हतां थोर वाटे सीण ॥ध्रु.॥ न पडावी निंदा । कानीं स्वामींची गोविंदा ॥2॥ तुका ह्मणे लाज । आह्मां स्वामीचें तें काज ॥3॥ 2222 कांहीं मागणें हें आह्मां अनुचित । वडिलांची रीत जाणतसों ॥1॥ देह तुच्छ जालें सकळ उपाधी । सेवेपाशीं बुिद्ध राहिलीसे ॥ध्रु.॥ शब्द तो उपाधि अचळ निश्चय । अनुभव हो काय नाहीं अंगीं ॥2॥ तुका ह्मणे देह फांकिला विभागीं । उपकार अंगीं उरविला ॥3॥ 2223 मागितल्यास कर पसरी । पळतां भरी वाखती ॥1॥ काय आह्मी नेणों वर्म । केला श्रम नेणतां ॥ध्रु.॥ बोलतां बरें येतां रागा । कठीण लागा मागेंमागें ॥2॥ तुका ह्मणे येथें बोली । असे चाली उफराटी ॥3॥ 2224 असो तुझें तुजपाशीं । आह्मां त्यासी काय चाड ॥1॥ निरोधें कां कोंडूं मन । समाधान असोनी ॥ध्रु.॥ करावा तो उरे आट । खटपट वाढतसे ॥2॥ तुका ह्मणे येउनि रागा । कां मी भागा मुकेन ॥3॥ 2225 आहे तें चि पुढें पाहों । बरे आहों येथें चि ॥1॥ काय वाढवूनि काम । उगा च श्रम तृष्णेचा ॥ध्रु.॥ िस्थरावतां ओघीं बरें । चाली पुरें पडेना ॥2॥ तुका ह्मणे विळतां मन । आह्मां क्षण न लगे ॥3॥ 2226 सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥1॥ कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥ नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥2॥ तुका ह्मणे आह्मां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं दुजें कांहीं ॥3॥ 2227 अनन्यासी ठाव एक सर्वकाजें । एकाविण दुजें नेणे चित्त ॥1॥ न पुरतां आळी देशधडी व्हावें । हें काय बरवें दिसतसे॥ध्रु.॥ लेंकराचा भार माउलीचे शिरीं । निढळ तें दुरी धरिलिया ॥2॥ तुका ह्मणे किती घातली लांबणी । समर्थ होउनि केवढएासाटीं ॥3॥ 2228 स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥1॥ खोटएा तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरि बरा ॥ध्रु.॥ ह्मणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥2॥ तुका ह्मणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥3॥ 2229 कांहीं च न लगे आदि अवसान । बहुत कठीण दिसतसां ॥1॥ अवघ्याच माझ्या वेचविल्या शHी । न चलेसी युिH जाली पुढें ॥ध्रु.॥ बोलिलें वचन हारपलें नभीं । उतरलों तों उभीं आहों तैसीं ॥2॥ तुका ह्मणे कांहीं न करावेंसें जालें । थकित चि ठेलें वित्त उगें ॥3॥ 2230 रूपें गोविलें चित्त । पायीं राहिलें नििंश्चत ॥1॥ तुह्मीं देवा अवघे चि गोमटे । मुख देखतां दुःख न भेटे ॥ध्रु.॥ जाली इंिद्रयां विश्रांति । भ्रमतां पीडत ते होतीं ॥2॥ तुका ह्मणे भेटी । सुटली भवबंदाची गांठी ॥3॥ ॥20॥ स्वामींनीं तेरा दिवस निद्रा केली. मग भगवंतें येऊन समाधान केलें कीं, कवित्व कोरडें आहे तें काढणें उदकांतून 2231 थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला । जनाचिया बोलासाटीं चित्त क्षोभविलें ॥1॥ भागविलासी केला सीण अधम मी यातिहीन । झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों ॥ध्रु.॥ अवघें घालूनियां कोडें तानभुकेचें सांकडें । योगक्षेम पुढें तुज करणें लागेल ॥2॥ उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका ह्मणे ब्रीद साच केलें आपुलें ॥3॥ 2232 तूं कृपाळू माउली आह्मां दीनांची साउली । न संरित आली बाळवेशें जवळी ॥1॥ माझें केलें समाधान रूप गोजिरें सगुण । निवविलें मन आलिंगन देऊनी ॥ध्रु.॥ कृपा केली जना हातीं पायीं ठाव दिला संतीं । कळों नये चित्तीं दुःख कैसें आहे तें॥2॥ तुका ह्मणे मी अन्यायी क्षमा करीं वो माझे आइऩ । आतां पुढें काइऩ तुज घालूं सांकडें ॥3॥ 2233 कापो कोणी माझी मान सुखें पीडोत दुर्जन । तुज होय सीण तें मी न करीं सर्वथा ॥1॥ चुकी जाली एकवेळा मज पासूनि चांडाळा । उभें करोनियां जळा माजी वहएा राखिल्या॥ध्रु.॥ नाहीं केला हा विचार माझा कोण अधिकार । समर्थासी भार न कळे कैसा घालावा ॥2॥ गेलें होऊनियां मागें नये बोलों तें वाउगें । पुढिलिया प्रसंगें तुका ह्मणे जाणावें ॥3॥ 2234 काय जाणें मी पामर पांडुरंगा तुझा पार । धरिलिया धीर काय एक न करिसी ॥1॥ उताविळ जालों आधीं मतिमंद हीनबुिद्ध । परि तूं कृपानिधी नाहीं केला अव्हेर ॥ध्रु.॥ तूं देवांचा ही देव अवघ्या ब्रह्मांडाचा जीव । आह्मां दासां कींव कां भाकणें लागली ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभरा मी तों पतित चि खरा । अन्याय दुसरा दारीं धरणें बैसलों ॥3॥ 2235 नव्हती आली सीसा सुरी अथवा घाय पाठीवरी । तो म्यां केला हरी एवढा तुह्मां आकांत ॥1॥ वांटिलासी दोहीं ठायीं मजपाशीं आणि डोहीं । लागों दिला नाहीं येथें तेथें आघात ॥ध्रु.॥ जीव घेती मायबापें थोडएा अन्याच्या कोपें । हें तों नव्हे सोपें साहों तों चि जाणीतलें ॥2॥ तुका ह्मणे कृपावंता तुज ऐसा नाहीं दाता। काय वाणूं आतां वाणी माझी कुंटली ॥3॥ वर्षाव केला 2236 तूं माउलीहून मयाळ चंद्राहूनि शीतळ । पाणियाहूनि पातळ कल्लोळ प्रेमाचा ॥1॥ देऊं काशाची उपमा दुजी तुज पुरुषोत्तमा । ओंवाळूनि नामा तुझ्या वरूनि टाकिलों ॥ध्रु.॥ तुवां केलें रे अमृता गोड त्या ही तूं परता । पांचां तkवांचा जनिता सकळ सत्तानायक ॥2॥ कांहीं न बोलोनि आतां उगा च चरणीं ठेवितों माथा । तुका ह्मणे पंढरिनाथा क्षमा करीं अपराध ॥3॥ 2237 मी अवगुणी अन्यायी किती ह्मणोन सांगों काइऩ । आतां मज पायीं ठाव देइप विठ्ठले ॥1॥ पुरे पुरे हा संसार कर्म बिळवंत दुस्तर । राहों नेदी िस्थर एके ठायीं निश्चळ ॥ध्रु.॥ अनेक बुिद्धचे तरंग क्षणक्षणां पालटती रंग । धरूं जातां संग तंव तो होतो बाधक ॥2॥ तुका ह्मणे आतां अवघी तोडीं माझी चिंता । येऊनि पंढरिनाथा वास करीं हृदयीं ॥3॥ ॥7॥ 2238 बरें आह्मां कळों आलें देवपण । आतां गुज कोण राखे तुझें ॥1॥ मारिलें कां मज सांग आजिवरी । आतां सरोबरी तुज मज ॥ध्रु.॥ जें आह्मी बोलों तें आहे तुझ्या अंगीं । देइऩन प्रसंगीं आजि शिव्या ॥2॥ निलाजिरा तुज नाहीं याति कुळ । चोरटा शिंदळ ठावा जना ॥3॥ खासी धोंडे माती जीव जंत झाडें । एकलें उघडें परदेसी ॥4॥ गाढव कुतरा ऐसा मज ठावा बइऩल तूं देवा भारवाही ॥5॥ लडिका तूं मागें बहुतांसी ठावा । आलें अनुभवा माझ्या तें ही ॥6॥ तुका ह्मणे मज खविळलें भांडा । आतां धीर तोंडा न धरवे ॥7॥ 2239 आह्मी भांडों तुजसवें । वर्मी धरूं जालें ठावें ॥1॥ होसी सरड बेडुक । बाग गांढएा ही पाइऩक ॥ध्रु.॥ बळ करी तया भ्यावें । पळों लागे तया घ्यावें ॥2॥ तुका ह्मणे दूर परता । नर नारी ना तूं भूता ॥3॥ 2240 काय साहतोसी फुका । माझा बुडविला रुका ॥1॥ रीण घराचें पांगिलें । तें न सुटे कांहीं केलें ॥ध्रु.॥ चौघांचिया मतें। आधीं खरें केलें होते ॥2॥ तुका ह्मणे यावरी । आतां भीड कोण धरी ॥3॥ 2241 प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥1॥ काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सबळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥ सलगी दिला लाड बोले तें तें वाटे गोड । करी बुझावोनि कोड हातीं देऊनि भातुकें॥2॥ तुका ह्मणे बोल कोणा हें कां नेणां नारायणा । सलगीच्या वचना कैचें उपजे विषम।3॥ ॥4॥ 2242 भार देखोनि वैष्णवांचे । दूत पळाले यमाचे ॥1॥ आले आले वैष्णववीर । काळ कांपती असुर ॥ध्रु.॥ गरुडटकयाच्या भारें । भूमी गर्जे जेजेकारें ॥ ।2॥ तुका ह्मणे काळ । पळे देखोनियां बळ ॥3॥ ॥1॥ 2243 रंगीं रंगें रे श्रीरंगे । काय भुललासी पतंगें ॥1॥ शरीर जायांचें ठेवणें । धरिसी अभिळास झणें ॥ध्रु.॥ नव्हे तुझा हा परिवार । द्रव्य दारा क्षणभंगुर ॥2॥ अंतकाळींचा सोइरा । तुका ह्मणे विठो धरा ॥3॥ ॥1॥ 2244 जन्मा येउनि काय केलें । तुवां मुदल गमाविलें॥1॥ कां रे न फिरसी माघारा । अझुनि तरी फजितखोरा ॥ध्रु.॥ केली गांठोळीची नासी । पुढें भीके चि मागसी ॥2॥ तुका ह्मणे ठाया । जाइप आपल्या आलिया ॥3॥ ॥1॥ 2245 पंढरीस जाते निरोप आइका । वैकुंठनायका क्षम सांगा ॥1॥ अनाथांचा नाथ हें तुझें वचन । धांवें नको दीन गांजों देऊं ॥ध्रु.॥ ग्रासिलें भुजंगें सर्पें महाकाळें । न दिसे हें जाळें उगवतां॥2॥ कामक्रोधसुनीं श्वापदीं बहुतीं । वेढलों आवताअ मायेचिये॥3॥ मृदजलनदी बुडविना तरी । आणूनियां वरी तळा नेते ॥4॥ तुका ह्मणे तुवां धरिलें उदास । तरि पाहों वास कवणाची॥5॥ 2246 कृपाळू सज्जन तुह्मी संतजन । हें चि कृपादान तुमचें मज ॥1॥ आठवण तुह्मी द्यावी पांडुरंगा । कींव माझी सांगा काकुलती ॥ध्रु.॥ अनाथ अपराधी पतिताआगळा । परि पायांवेगळा नका करूं ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी निरविल्यावरि । मग मज हरि उपेक्षीना ॥3॥ 2247 संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥1॥ ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥ भागलिया मज वाहतील कडे । यांचियातें जोडे सर्व सुख ॥2॥ तुका ह्मणे शेष घेइऩन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥3॥ ॥3॥ 2248 लाघवी सूत्रधारी दोरी नाचवी कुसरी । उपजवी पाळूनि संसारि नानापरिचीं लाघवें ॥1॥ पुरोनि पंढरिये उरलें भिHसुखें लांचावलें । उभें चि राहिलें कर कटीं न बैसे ॥ध्रु.॥ बहु काळें ना सावळें बहु कठिण ना कोंवळें । गुणत्रया वेगळें बहुबळें आथीलें ॥2॥ असोनि नसे सकळांमधीं मना अगोचर बुद्धी । स्वामी माझा कृपानिधि तुका ह्मणे विठ्ठल ॥3॥ 2249 कीर्तन ऐकावया भुलले श्रवण । श्रीमुख लोचन देखावया ॥1॥ उदित हें भाग्य होइऩल कोणे काळीं । चित्त तळमळी ह्मणऊनि ॥ध्रु.॥ उतावीळ बाहएा भेटिलागीं दंड । लोटांगणीं धड जावयासी ॥2॥ तुका ह्मणे माथा ठेवीन चरणीं । होतील पारणी इंिद्रयांची ॥3॥ 2250 नाम घेतां कंठ शीतळ शरीर । इंिद्रयां व्यापार नाठवती ॥1॥ गोड गोमटें हें अमृतासी वाड । केला कइवाड माझ्या चित्तें ॥ध्रु.॥ प्रेमरसें जाली पुष्ट अंगकांति । त्रिविध सांडिती ताप अंग ॥2॥ तुका ह्मणे तेथें विकाराची मात । बोलों नये हित सकळांचें ॥3॥ ॥3॥ 2251 स्वामिकाज गुरुभिH । पितृवचन सेवा पति ॥1॥ हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥ सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥2॥ निश्चयाचें बळ । तुका ह्मणे तें च फळ ॥3॥ 2252 चित्त घेऊनियां तू काय देसी । ऐसें मजपासीं सांग आधीं ॥1॥ तरि च पंढरिराया करिन साटोवाटी । नेघें जया तुटी येइऩल तें ॥ध्रु.॥ रििद्धसििद्ध कांहीं दाविसी अभिळास । नाहीं मज आस मुHीची ही ॥2॥ तुका ह्मणे तुझें माझें घडे तर । भHीचा भाव रे देणें घेणें ॥3॥ 2253 तुझा संग पुरे संग पुरे । संगति पुरे विठोबा ॥1॥ आपल्या सारिखें करिसी दासां । भिकारिसा जग जाणे ॥ध्रु.॥ रूपा नाहीं ठाव नांवा । तैसें आमुचें करिसी देवा ॥2॥ तुका ह्मणे तोयें आपुलें भेंडोळें । करिसी वाटोळें माझें तैसें ॥3॥ 2254 आतां मज तारीं । वचन हें साच करीं ॥1॥ तुझें नाम दिनानाथ । िब्रदावळी जगविख्यात ॥ध्रु.॥ कोण लेखी माझ्या दोषा । तुझा त्रिभुवनीं ठसा ॥2॥ वांयां जातां मज । तुका ह्मणे तुह्मां लाज ॥3॥ 2255 विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा॥1॥ मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥ उभयकुळींसाक्ष। तूं चि माझा मातुळपक्ष ॥2॥ समपिऩली काया । तुका ह्मणे पंढरिराया॥3॥ 2256 वेदाचा तो अर्थ आह्मांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥1॥ खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥ उत्पित्तपाळणसंहाराचें निज । जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥2॥ तुका ह्मणे आलें आपण चि फळ । हातोहातीं मूळ सांपडलें ॥3॥ 2257 आमचा तूं ॠणी ठायींचा चि देवा । मागावया ठेवा आलों दारा ॥1॥ वर्म तुझें आह्मां सांपडलें हातीं । धरियेले चित्तीं दृढ पाय ॥ध्रु.॥ बैसलों धरणें कोंडोनियां द्वारीं । आंतूनि बाहेरी येओं नेदी ॥2॥ तुज मज सरी होइल या विचारें । जळो भांडखोरें निलाजिरीं ॥3॥ भांडवल माझें मिरविसी जनीं । सहजर वोवनी नाममाळा ॥4॥ तुका ह्मणे आह्मी केली जिवें साटी । तुह्मां आह्मां तुटी घालूं आतां ॥5॥ 2258 काय धोविलें बाहेरी मन मळलें अंतरीं । गादलें जन्मवरीं असत्यकाटें काटलें ॥1॥ सांडी व्यापार दंभाचा शुद्ध करीं रे मन वाचा । तुझिया चित्ताचा तूं च ग्वाही आपुला ॥ध्रु.॥ पापपुण्यविटाळ देहीं भरितां न विचारिसी कांहीं । काय चाचपसी मही जी अखंड सोंवळी ॥2॥ कामक्रोधा वेगळा ऐसा होइप कां सोंवळा । तुका ह्मणे कळा गुंडुन ठेवीं कुसरी ॥3॥ 2259 ऊंस वाढवितां वाढली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी ॥1॥ सत्यकर्में आचरें रे । बापा सत्यकर्में आचरें रे । सत्यकर्में आचरें होइऩल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥ साकरेच्या आळां लाविला कांदा । स्थूळसानापरि वाढे दुगपधा ॥2॥ सत्य असत्य हें ऐसिया परी । तुका ह्मणे याचा विचार करीं ॥3॥ 2260 पाषाण देव पाषाण पायरी । पूजा एकावरी पाय ठेवी ॥1॥ सार तो भाव सार तो भाव । अनुभवीं देव ते चि जाले॥ध्रु.॥ उदका भिन्न पालट काइऩ । गंगा गोड येरां चवी काय नाहीं ॥2॥ तुका ह्मणे हें भाविकांचें वर्म । येरीं धर्माधर्म विचारावें॥3॥ ॥10॥ 2261 जन्मा येऊनि कां रे निदसुरा । जायें भेटी वरा रखुमाइऩच्या ॥1॥ पाप ताप दैन्य जाइऩल सकळ । पावसी अढळउत्तम तें ॥ध्रु.॥ संतमहंतसिद्धहरिदासदाटणी । फिटती पारणीं इंिद्रयांचीं॥2॥ तुका ह्मणे तेथें नामाचा गजर । फुकाची अपार लुटी घेइप ॥3॥ 2262 काय धोविलें कातडें । काळकुट भीतरि कुडें ॥1॥ उगा राहें लोकभांडा । चाळविल्या पोरें रांडा ॥ध्रु.॥ घेसी बुंथी पानवथां । उगा च हालविसी माथा ॥2॥ लावूनि बैसे टाळी । मन इंिद्रयें मोकळीं ॥3॥ हालवीत बैस माळा । विषयजप वेळोवेळां॥4॥ तुका ह्मणे हा व्यापार । नाम विठोबाचें सार ॥5॥ ॥2॥ 2263 येइप वो येइप वो येइप धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥1॥ विठाबाइऩ विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥ न करीं न करीं न करीं आतां अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैंचें दूरि अंतरु ॥2॥ नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका ह्मणे हांवा हांवा हांवा साधावा ॥3॥ 2264 हें चि याच्या ऐसें मागावें दान । वंदूनि चरण नारायणा ॥1॥ धीर उदारींव निर्मळ निर्मत्सर । येणें सर्वेश्वर ऐसें नांव ॥ध्रु.॥ हा चि होइऩजेल याचिया विभागें । अनुभववी अंगें अनुभववील ॥2॥ जोडे तयाचे कां न करावे सायास । जाला तरि अळस दीनपणे ॥3॥ पावल्यामागें कां न घलावी धांव । धरिल्या तरि हांव बळ येतें ॥4॥ तुका ह्मणे घालूं खंडीमध्ये टांक । देवाचें हें एक करुनी घेऊं ॥5॥ 2265 सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥1॥ तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥ आसेविण नाहीं उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदीं ॥2॥ तुका ह्मणे आतां व्हावें याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥3॥ 2266 करितां होया व्हावें चित्त चि नाहीं । घटापटा कांहीं करूं नये ॥1॥ मग हालत चि नाहीं जवळून । करावा तो सीण सीणवितो ॥ध्रु.॥ साहत चि नाहीं कांहीं पांकुळलें । उगल्या उगलें ढळत आहे ॥2॥ तुका ह्मणे तरी बोलावें झांकून । येथें खुणे खूण पुरतें चि ॥3॥ 2267 संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूतिऩमंत ॥1॥ घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥ आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥2॥ तुका ह्मणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥3॥ 2268 पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥1॥ अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥ इच्छेऐसी आवड पुरे । विश्वंभरे जवळी ॥2॥ तुका करी नारायण । या या सेवन नामाचें॥3॥ 2269 सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥1॥ करुण सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥ सरे ऐसा नाहीं झरा। पंHी करा समवेत ॥2॥ तुका ह्मणे बरवा पान्हा । कान्हाबाइऩ माउलीचा ॥3॥ 2270 पाहतां तव एकला दिसे । कैसा असे व्यापक ॥1॥ ज्याचे त्याचे मिळणीं मिळे । तरी खेळे बहुरूपी ॥ध्रु.॥ जाणिवेचें नेदी अंग । दिसों रंग निवडीना ॥2॥ तुका ह्मणे ये चि ठायीं । हें तों नाहीं सर्वत्र ॥3॥ ॥8॥ 2271 तुह्मांसाटीं आह्मां आपुला विसर । करितां अव्हेर कैसें दिसे ॥1॥ विचाराजी आतां ठायीचें हे देवा । आह्मां नये हेवा वाढवितां ॥ध्रु.॥ आलों टाकोनियां सुखाची वसती । पुढें माझ्या युिH खुंटलिया ॥2॥ तुका ह्मणे जाला सकळ वृत्तांत । केला प्रणिपात ह्मणऊनि ॥3॥ 2272 करावा उद्धार हें तुह्मां उचित । आह्मी केली नीत कळली ते ॥1॥ पाववील हाक धांवा ह्मणऊन । करावें जतन ज्याचें तेणें ॥ध्रु.॥ दुिश्चतासी बोल ठेवायासी ठाव । ऐसा आह्मी भाव जाणतसों ॥2॥ तुका ह्मणे माझें कायावाचामन । दुसरें तें ध्यान करित नाही ॥3॥ 2273 संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥1॥ ह्मणऊनि बहु तळमळी चित्त । येइप वो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥ उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥2॥ तुका ह्मणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥3॥ 2274 काळावरि घालूं तरि तो सरिसा । न पुरतां इच्छा दास कैसे ॥1॥ आतां नाहीं कांहीं उसिराचें काम । न खंडावें प्रेम नारायणा ॥ध्रु.॥ देणें लागे मग विलंब कां आड । गोड तरि गोड आदि अंत ॥2॥ तुका ह्मणे होइल दरुषणें नििंश्चती । गाइऩन तें गीतीं ध्यान मग ॥3॥ 2275 परउपकारें कायावाचामन । वेचे सुदर्शन रक्षी तया॥1॥ याजसाटीं असें योजिलें श्रीपति । संकल्पाचे हातीं सर्व जोडा॥ध्रु.॥ परपीडे ज्याची जिव्हा मुंडताळे । यमदूत डाळे करिती पूजा ॥2॥ तुका ह्मणे अंबॠषी दुयाौधना । काय झालें नेणां दुर्वासया ॥3॥ 2276 हागिल्याचे सिंके वोणवा चि राहे । अपशकुन पाहे वेडगळ ॥1॥ अत्यंत समय नेणतां अवकळा । येऊं नये बळा सिक धरा ॥ध्रु.॥ भोजनसमयीं ओकाचा आठव । ठकोनियां जीव कष्टी करी ॥2॥ तुका ह्मणे किती सांगों उगवून । अभाग्याचे गुण अनावर ॥3॥ 2277 नारे तरि काय नुजेडे कोंबडें । करूनियां वेडें आघ्रो दावी ॥1॥ आइत्याचें साहे फुकाचा विभाग । विक्षेपानें जग ची थू करी ॥ध्रु.॥ नेमून ठेविला करत्यानें काळ । नल्हायेसें बळ करूं पुढें॥2॥ तुका ह्मणे देव साहे जाल्यावरी । असांग चि करी सर्व संग ॥3॥ ॥7॥ 2278 तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥1॥ अवघा चि एकीं ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ निरविलें तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥2॥ तुका ह्मणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥3॥ 2279 वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें । अंधापुढें दीप नाचती नाचणें । भिHभावेंविण भिH तैसी ॥1॥ तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया । खादलें ह्मणोनि सेवटीं बोबाली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥ मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काइऩ होय । नपुंसका काय करील पिद्मणी । रुचिविण वाणी तैसे होय॥2॥ हात पाय नाहीं करिल तो काइऩ । वृक्षा फळ आहे अमोलिक। हातां नये तैसा वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं ह्मणे तुका ॥3॥ 2280 मेघवृष्टीनें करावा उपदेश परि गुरुनें न करावा शिष्य। वांटा लाभे त्यास केल्या अर्धकर्माचा ॥1॥ द्रव्य वेचावें अन्नसत्रीं भूतीं द्यावें सर्वत्र । नेदावा हा पुत्र उत्तमयाती पोसना ॥ध्रु.॥ बीज न पेरावें खडकीं ओल नाहीं ज्याचे बुडखीं । थीतां ठके सेखीं पाठी लागे दिवाण ॥2॥ गुज बोलावें संतांशीं पत्नी राखावी जैसी दासी । लाड देतां तियेसी वांटा पावे कर्माचा ॥3॥ शुद्ध कसूनिपाहावें वरि रंगा न भुलावें । तुका ह्मणे घ्यावें जया नये तुटी तें ॥4॥ 2281 नावडावें जन नावडावा मान । करूनि प्रमाण तूं चि होइप ॥1॥ सोडुनि देहसंबंध वेसनें । ऐसी नारायणें कृपा कीजे॥ध्रु.॥ नावडावें रूप नावडावे रस । अवघी राहो आस पायांपाशीं ॥2॥ तुका ह्मणे आतां आपुलिया सत्ता । करूनि अनंता ठेवा ऐसें ॥3॥ 2282 उपाधिवेगळे तुह्मी निविऩकार । कांहीं च संसार तुह्मां नाहीं ॥1॥ ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥ निसंग तुह्मांसी राहणें एकट । नाहीं कटकट साहों येक ॥2॥ तुका ह्मणे नाहीं मिळों येत शिळा । रंगासी सकळा स्पटिकाची ॥3॥ 2283 माहार माते चपणी भरे । न कळे खरें पुढील ॥1॥ वोंगळ अधमाचे गुण । जातां घडी न लगे चि ॥ध्रु.॥ श्वान झोळी स्वामिसत्ता । कोप येतां उतरे ॥2॥ तुका ह्मणे गुमान कां । सांगों लोकां अधमासी ॥3॥ 2284 डोऑयामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥1॥ तैसें शुद्ध करीं हित । नका चित्त बाटवूं ॥ध्रु.॥ आपल्याचा कळवळा। आणिका बाळावरि न ये ॥2॥ तुका ह्मणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या ॥3॥ 2285 मुखीं नाम हातीं मोक्ष । ऐसी साक्ष बहुतांसी ॥1॥ वैष्णवांचा माल खरा । तुरतुरा वस्तूसी ॥ध्रु.॥ भस्म दंड न लगे काठी । तीर्थां आटी भ्रमण ॥2॥ तुका ह्मणे आडकाठी । नाहीं भेटी देवाचे ॥3॥ 2286 आगी लागो तया सुखा । जेणें हरि नये मुखा ॥1॥ मज होत कां विपित्त । पांडुरंग राहो चित्तीं ॥ध्रु.॥ जळो तें समूळ। धन संपित्त उत्तम कुळ ॥2॥ तुका ह्मणे देवा । जेणें घडे तुझी सेवा॥3॥ 2287 आतां न ह्मणे मी माझें । नेघें भार कांहीं ओझें ॥1॥ तूं चि तारिता मारिता । कळों आलासी निरुता ॥ध्रु.॥ अवघा तूं चि जनादऩन । संत बोलती वचन ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । तुझ्या रिगालों वोसंगा ॥3॥ 2288 समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥1॥ ह्मणऊनि कोणीं न करावा आळस । ह्मणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥ सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥2॥ सकळ ही तीथॉ प्रयाग काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥3॥ कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥4॥ तुका ह्मणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥5॥ 2289 अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळीं न घडे साधन । उचित विधि विधान न कळे न घडे सर्वथा ॥1॥ भिHपंथ बहु सोपा पुण्य नागवया पापा । येणें जाणें खेपा येणें चि एक खंडती॥ध्रु.॥ उभारोनि बाहे विठो पालवीत आहे । दासां मी चि साहे मुखें बोले आपुल्या ॥2॥ भाविक विश्वासी पार उतरिलें त्यांसी । तुका ह्मणे नासी कुतक्याऩचे कपाळीं ॥3॥ 2290 आह्मीं नामाचें धारक नेणों प्रकार आणीक । सर्व भावें एक विठ्ठल चि प्रमाण ॥1॥ न लगे जाणावें नेणावें गावें आनंदें नाचावें । प्रेमसुख घ्यावें वैष्णवांचे संगती ॥ध्रु.॥ भावबळें घालूं कास लज्जा चिंता दवडूं आस । पायीं निजध्यास ह्मणों दास विष्णूचे ॥2॥ भय नाहीं जन्म घेतां मोक्षपदा हाणों लाता । तुका ह्मणे सत्ता धरूं निकट सेवेची ॥3॥ 2291 आह्मी हरिचे सवंगडे जुने ठायींचे वेडे बागडे । हातीं धरुनी कडे पाठीसवें वागविलों ॥1॥ ह्मणोनि भिन्न भेद नाहीं देवा आह्मां एकदेहीं । नाहीं जालों कहीं एका एक वेगळे ॥ध्रु.॥ निद्रा करितां होतों पायीं सवें चि लंका घेतली तइप । वान्नरें गोवळ गाइऩ सवें चारित फिरतसों ॥2॥ आह्मां नामाचें चिंतन राम कृष्ण नारायण। तुका ह्मणे क्षण खातां जेवितां न विसंभों ॥3॥ 2292 मागें बहुतां जन्मीं हें चि करित आलों आह्मी । भवतापश्रमी दुःखें पीडिलीं निववूं त्यां ॥1॥ गजाॉ हरिचे पवाडे मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे काढूं पाषाणामध्यें ॥ध्रु.॥ भाव शुद्ध नामावळी हषॉ नाचों पिटूं टाळी । घालूं पायां तळीं किळकाळ त्याबळें ॥2॥ कामक्रोध बंदखाणी तुका ह्मणे दिले दोन्ही । इंिद्रयांचे धणी आह्मी जालों गोसांवी ॥3॥ 2293 अमर तूं खरा । नव्हे कैसा मी दातारा ॥1॥ चाल जाऊं संतांपुढें । वाद सांगेन निवाडें ॥ध्रु.॥ तुज नांव जर नाहीं । तर माझें दाव काइऩ ॥2॥ तुज रूप नाहीं । तर माझें दाव काइऩ॥3॥ खळसी तूं लीळा । तेथें मी काय वेगळा ॥4॥ साच तूं लटिका । तैसा मी ही ह्मणे तुका ॥5॥ 2294 मंत्र चळ पिसें लागतें सत्वर । अबद्ध ते फार तरले नामें ॥1॥ आशोचे तो बाधी आणिकां अक्षरां । नाम निदसुरा घेतां तरे ॥ध्रु.॥ रागYाानघात चुकतां होय वेळ । नाम सर्वकाळ शुभदायक॥2॥ आणिकां भजना बोलिला निषेध । नाम तें अभेद सकळां मुखीं ॥3॥ तुका ह्मणे तपें घालिती घालणी । वेश्या उद्धरूनि नेली नामें ॥4॥ 2295 नव्हती ते संत करितां कवित्व । संताचे ते आप्त नव्हती संत ॥1॥ येथें नाहीं वेश सरतें आडनांवें । निवडे घावडाव व्हावा अंगीं ॥ध्रु.॥ नव्हती ते संत धरितां भोंपळा । करितां वाकळा प्रावरण ॥2॥ नव्हती ते संत करितां कीर्तन । सांगतां पुराणें नव्हती संत ॥3॥ नव्हती ते संत वेदाच्या पठणें । कर्म आचरणें नव्हती संत ॥4॥ नव्हती संत करितां तप तीर्थाटणें । सेविलिया वन नव्हती संत ॥5॥ नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणें । भस्म उधळणें नव्हती संत ॥6॥ तुका ह्मणे नाहीं निरसला देहे । तों अवघे हे सांसारिक ॥7॥ 2296 हें चि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥1॥ गुण गाइऩन आवडी । हे चि माझी सर्व जोडी ॥ध्रु.॥ न लगे मुिH आणि संपदा । संतसंग देइप सदा ॥2॥ तुका ह्मणे गर्भवासीं । सुखें घालावें आह्मासी ॥3॥ 2297 भाग्यवंता हे परवडी । करिती जोडी जन्माची ॥1॥ आपुलाल्या लाहो भावें । जें ज्या व्हावें तें आहे ॥ध्रु.॥ इच्छाभोजनाचा दाता । न लगे चिंता करावी ॥2॥ तुका ह्मणे आल्या था†या । वस्तु ब†या मोलाच्या ॥3॥ 2298 वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥1॥ जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥ मेला राखे दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥2॥ तुका ह्मणे देवा । लोभें न पुरे चि सेवा॥3॥ 2299 अधीरा माझ्या मना ऐक एकी मात । तूं कां रे दुिश्चत निरंतर ॥1॥ हे चि चिंता काय खावें ह्मणऊनि । भले तुजहूनि पिक्षराज ॥ध्रु.॥ पाहा ते चातक नेघे भूमिजळा । वरुषे उन्हाळा मेघ तया ॥2॥ सकळयातींमध्यें ठक हा सोनार । त्याघरीं व्यापार झारियाचा ॥3॥ तुका ह्मणे जळीं वनीं जीव एक । तयापाशीं लेख काय असे ॥4॥ 2300 कां रे नाठविसी कृपाळु देवासी । पोसितो जनासी एकला तो ॥1॥ बाळा दुधा कोण करितें उत्पत्ती । वाढवी श्रीपति सवें दोन्ही ॥ध्रु.॥ फुटती तरुवर उष्णकाळमासीं । जीवन तयांसी कोण घाली ॥2॥ तेणें तुझी काय नाहीं केली चिंता । राहे त्या अनंता आठवूनि ॥3॥ तुका ह्मणे ज्याचें नाम विश्वंभर । त्याचें निरंतर ध्यान करीं ॥4॥ 2301 उदारा कृपाळा पतितपावना । िब्रदें नारायणा साच तुझीं ॥1॥ वणिऩलासी जैसा जाणतां नेणतां । तैसा तूं अनंता साच होसी ॥ध्रु.॥ दैत्यां काळ भHां मेघश्याममूतिऩ । चतुर्भुज हातीं शंख चक्र ॥2॥ काम इच्छा तयां तैसा होसी राणीं । यशोदेच्या स्तनीं पान करी ॥3॥ होऊनि सकळ कांहींच न होसी । तुका ह्मणे यासी वेद ग्वाही ॥4॥ 2302 ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे बोल । करीं लाड तुह्मांपुढें हो कोणी झणी कोपाल ॥1॥ उपाय साधन आइका कोण गति अवगति । दृढ बैसोनि सादर तुह्मी धरावें चित्तीं ॥ध्रु.॥ धर्म तयासी घडे रे ज्याचे स्वाधीन भाज । कर्म तयासी जोडे रे भीत नाहीं लाज ॥2॥ पुण्य तें जाणां रे भाइनो परउपकाराचें । परपीडा परनिंदा रे खरें पाप तयाचें ॥3॥ लाभ तयासी जाला रे मुखीं देव उच्चारी । प्रपंचापाठी गुंतला हाणी तयासी च थोरी ॥4॥ सुख तें जाणा रे भाइनो संतसमागम । दुःख तें जाणारे भाइनो शम तेथे विशम ॥5॥ साधन तयासी साधे रे ज्याची स्वाधीन बुिद्ध । पराधीनासी आहे घात रे थोर जाण संबंधी ॥6॥ मान पावे तो आगळा मुख्य इंिद्रयें राखे । अपमानी तो अधररसस्वाद चाखे॥6॥ जाणता तयासी बोलिजे जाणे समाधान । नेणता तयासी बोलिजे वाद करी भूषण ॥8॥ भला तो चि एक जाणा रे गयावर्जन करी । बुरा धन नष्ट मेळवी परद्वार जो करी ॥9॥ आचारी अन्न काढी रे गाइऩ अतितभाग । अनाचारी करी भोजन ग्वाही नसतां संग ॥10॥ स्वहित तेणें चि केलें रे भूतीं देखिला देव । अनहित तयाचें जालें रे आणी अहंभाव ॥11॥ धन्य जन्मा ते चि आले रे एक हरिचे दास । धिग ते विषयीं गुंतले केला आयुष्या नास ॥12॥ जोहोरि तो चि एक जाणा रे जाणे सिद्धलक्षणें । वेडसरु तो भुले रे वरदळभूषणें ॥13॥ बिळयाढा तो चि जाणा रे भिH दृढ शरीरीं। गांढएा तयासी बोलिजे एक भाव न धरी ॥14॥ खोल तो वचन गुरूचें जो गिळूनि बैसे । उथळ धीर नाहीं अंगीं रे ह्मणे होइऩल कैसें॥15॥ उदार तो जीवभाव रे ठेवी देवाचे पायीं । कृपण तयासी बोलिजे पडे उपाधिडाइप ॥16॥ चांगलेंपण तें चि रे ज्याचें अंतर शुद्ध । वोंगळ मिळन अंतरीं वाणी वाहे दुगपध ॥17॥ गोड तें चि एक आहे रे सार विठ्ठलनाम । कडु तो संसार रे लक्षचौ†याशी जन्म ॥18॥ तुका ह्मणे मना घरी रे संतसंगतिसोइऩ । न लगे कांहीं करावें राहें विठ्ठलपायीं ॥19॥ ॥ येकाखडी ॥ 1॥ 2303 करावा कैवाड । नाहीं तरी आला नाड ॥1॥ स्मरा पंढरीचा देव । मनीं धरोनिया भाव ॥ध्रु.॥ खचविलें काळें । उगवा लवलाहें जाळें ॥2॥ गजर नामाचा । करा लवलाहे वाचा ॥3॥ घरटी चक्रफेरा । जन्ममृत्याचा भोंवरा ॥4॥ नानाहव्यासांची जोडी। तृष्णा करी देशधडी ॥5॥ चरणीं ठेवा चित्त । ह्मणवा देवाचे अंकित ॥6॥ छंद नानापरी । कळा न पविजे हरी ॥7॥ जगाचा जनिता । भुिHमुHींचा ही दाता ॥8॥ झणी माझें माझें । भार वागविसी ओझें ॥9॥ यांची कां रे गेली बुिद्ध । नाहीं तरायाची शुिद्ध ॥10॥ टणक धाकुलीं । अवघीं सरती विठ्ठलीं ॥11॥ ठसा त्रिभुवनीं । उदार हा शिरोमणि ॥12॥ डगमगी तो वांयां जाय । धीर नाहीं गोता खाय ॥13॥ ढळों नये जरी । लाभ घरिचिया घरीं॥14॥ नाहीं ऐसें राहे । कांहीं नासिवंत देहे ॥15॥ तरणा भाग्यवंत । नटे हरिकीर्तनांत ॥16॥ थडी टाकी पैलतीर । बाहे ठोके होय वीर ॥17॥ दया तिचें नांव । अहंकार जाय जंव॥18॥ धनधान्य हेवा । नाडे कुटुंबाची सेवा ॥19॥ नाम गोविंदाचें । घ्या रे हें चि भाग्य साचें ॥20॥ परउपकारा । वेचा शिH निंदा वारा॥21॥ फळ भोग इच्छा । देव आहे जयां तैसा ॥22॥ बरवा ऐसा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥23॥ भविष्याचे माथां । भजन न द्यावें सर्वथा ॥24॥ माग लागला न संडीं । अळसें माती घालीं तोंडीं ॥25॥ यश कीतिऩ मान । तरी जोडे नारायण ॥26॥ रवि लोपे तेजें । जरी हारपे हें दुजें ॥27॥ लकार लाविला । असतां नसतां चि उगला ॥28॥ वासने चि धाडी । बंद खोडएा नाडएा बेडी ॥29॥ सरतें न कळे । काय झांकियेले डोळे ॥30॥ खंती ते न धरा । होणें गाढव कुतरा ॥31॥ सायासाच्या जोडी । पिके काढियेल्या पेडी ॥32॥ हातीं हित आहे । परि न करिसी पाहें॥33॥ अळंकार लेणें । ल्या रे तुळसीमुद्राभूषणें ॥34॥ ख्याति केली विष्णुदासीं । तुका ह्मणे पाहा कैसी ॥35॥ 2304 देवें देऊळ सेविलें । उदक कोरडें चि ठेविलें ॥1॥ नव्हे मत गूढ उमानें कांहीं । तूं आपणआपणापें पाहीं ॥ध्रु.॥ पाठें पूर वोसंडला । सरिता सागर तुंबोनि ठेला ॥2॥ वांजेघरीं बाळ तान्हा । एक बाळी दों कानां ॥3॥ तुका ह्मणे पैस । अनुभविया ठावा गोडीरस ॥4॥ ॥ लोहागांवीं कीर्तनांत मेलें मूल जीत झालें ते समयीं स्वामींनीं अभंग केले ते ॥ 2305 अशक्य तों तुह्मां नाहीं नारायणा । निर्जीवा चेतना आणावया ॥1॥ मागें काय जाणों स्वामीचे पवाडे । आतां कां रोकडे दावूं नये ॥ध्रु.॥ थोर भाग्य आह्मी समर्थाचे कासे । ह्मणवितों दास काय थोडें ॥2॥ तुका ह्मणे माझे निववावे डोळे । दावूनि सोहळे सामर्थ्याचे ॥3॥ 2306 दाता तो एक जाणा । नारायणा स्मरवी ॥1॥ आणीक नासिवंतें काय । न सरे हाय ज्यांच्यानें ॥ध्रु.॥ यावें तयां काकुलती । जे दाविती सुपंथ ॥2॥ तुका ह्मणे उरी नुरे । त्याचे खरे उपकार ॥3॥ अलंकापुरीं ब्राह्मण धरणें बसून बेताळीस दिवस उपवासी होता त्यास द्दष्टांत कीं देहूस तुकोबापाशी जाणें. ब्राह्मण स्वामीपें आला त्याबद्दल अभंग ॥ 31 ॥ 2307 श्रीपंढरीशा पतितपावना । एक विYाापना पायांपाशीं॥1॥ अनाथां जीवांचा तूं काजकैवारी । ऐसी चराचरीं िब्रदावळी ॥ध्रु.॥ न संगतां कळे अंतरीचें गुज । आतां तुझी लाज तुज देवा ॥2॥ आिळकर ज्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देऊनियां ॥3॥ तुका ह्मणे तूं चि खेळें दोहीं ठायीं । नसेल तो देइप धीर मना ॥4॥ 2308 अगा ये उदारा अगा विश्वंभरा । रखुमाइऩच्या वरा पांडुरंगा ॥1॥ अगा सवाौत्तमा अगा कृष्णा रामा । अगा मेघश्यामा विश्वजनित्या ॥ध्रु.॥ अगा कृपावंता जीवन तूं दाता । अगा सर्वसत्ता धरितया ॥2॥ अगा सर्वजाणा अगा नारायणा । करुणवचना चित्त द्यावें ॥3॥ तुका ह्मणे नाहीं अधिकार तैसी । सरती पायांपाशीं केली मागें ॥4॥ 2309 नव्हें दास खरा । परि जाला हा डांगोरा ॥1॥ यासी काय करूं आतां । तूं हें सकळ जाणता ॥ध्रु.॥ नाहीं पुण्यगाठीं । जे हें वेचूं कोणासाठीं ॥2॥ तुका ह्मणे कां उपाधी । वाढविली कृपानिधी ॥3॥ 2310 तुजविण सत्ता । नाहीं वाचा वदविता ॥1॥ ऐसे आह्मी जाणों दास । ह्मणोनि जालों उदास ॥ध्रु.॥ तुह्मी दिला धीर। तेणें मन झालें िस्थर ॥2॥ तुका ह्मणे आड । केलों मी हें तुझें कोड॥3॥ 2311 काय मी जाणता । तुह्मांहुनि अनंता ॥1॥ जो हा करूं अतिशय । कां तुह्मां दया नये ॥ध्रु.॥ काय तुज नाहीं कृपा । विश्वाचिया मायबापा ॥2॥ तुका ह्मणे वाणी । माझी वदे तुह्मांहुनि॥3॥ 2312 काय Yाानेश्वरीं उणें । तिंहीं पाठविलें धरणें ॥1॥ ऐकोनियां लिखित । ह्मुण जाणवली हे मात ॥ध्रु.॥ तरी जाणे धणी। वदे सेवकाची वाणी ॥2॥ तुका ह्मणे ठेवा । होतां सांभाळावें देवा ॥3॥ 2313 ठेवूनियां डोइऩ । पायीं जालों उतराइऩ ॥1॥ कारण तें तुह्मीं जाणां । मी तराळ नारायणा ॥ध्रु.॥ प्रसंगीं वचन । दिलें तें चि खावें अन्न ॥2॥ तुका ह्मणे भार । तुह्मी जाणां थोडा फार ॥3॥ उपदेश अभंग ॥ 11 ॥ 2314 नको कांहीं पडों ग्रंथाचे भरीं । शीघ व्रत करीं हें चि एक ॥1॥ देवाचिये चाडे आळवावें देवा । ओस देहभावा पाडोनियां॥ध्रु.॥ साधनें घालिती काळाचिये मुखी । गर्भवास सेकीं न चुकती ॥2॥ उधाराचा मोक्ष होय नव्हे ऐसा । पतनासी इच्छा आवश्यक ॥3॥ रोकडी पातली अंगसंगें जरा । आतां उजगरा कोठवरि ॥4॥ तुका ह्मणे घालीं नामासाठी उडी । पांडुरंग थडी पाववील ॥5॥ 2315 नाहीं देवापाशीं मोक्षाचे गांठोळें । आणूनि निराळें द्यावें हातीं ॥1॥ इंिद्रयांचा जय साधुनियां मन । निविऩषय कारण असे तेथें ॥ध्रु.॥ उपास पारणीं अक्षरांची आटी । सत्कर्मां शेवटीं असे फळ ॥2॥ आदरें संकल्प वारीं अतिशय । सहज तें काय दुःख जाण ॥3॥ स्वप्नींच्या घायें विळवसी वांयां । रडे रडतियासवें मिथ्या ॥4॥ तुका ह्मणे फळ आहे मूळापाशीं । शरण देवासीं जाय वेगीं ॥5॥ 2316 तजिलें भेटवी आणूनि वासना । दाविल्याचे जना काय काज ॥1॥ आळवावें देवा भाकूनि करुणा । आपुलिया मना साक्ष करीं ॥ध्रु.॥ नाहीं जावें यावें दुरूनि लागत । आहे साक्षभूत अंतरींचा ॥2॥ तुका ह्मणे हा आहे कृपासिंधु। तोडी भवबंधु तात्कािळक ॥3॥ 2317 गोविंद गोविंद । मना लागलिया छंद ॥1॥ मग गोविंद ते काया । भेद नाहीं देवा तया ॥ध्रु.॥ आनंदलें मन । प्रेमें पाझरती लोचन ॥2॥ तुका ह्मणे आळी । जेवी नुरे चि वेगळी॥3॥ 2318 ज्याचें जया ध्यान । तें चि होय त्याचें मन ॥1॥ ह्मणऊनि अवघें सारा । पांडुरंग दृढ धरा ॥ध्रु.॥ सम खूण ज्याचे पाय । उभा व्यापक विटे ठाय ॥2॥ तुका ह्मणे नभा । परता अनूचा ही गाभा ॥3॥ 2319 पाहुनियां ग्रंथ करावें कीर्तन । तेव्हां आलें जाण फळ त्याचें ॥1॥ नाहीं तरि वांयां केली तोंडपिटी । उरी ते शेवटी उरलीसे ॥ध्रु.॥ पढोनियां वेद हरिगुण गावे । ठावें तें जाणावें तेव्हां जालें ॥2॥ तप तिर्थाटण तेव्हां कार्यसििद्ध । िस्थर राहे बुिद्ध हरिच्या नामीं ॥3॥ यागयYाादिक काय दानधर्म । तरि फळ नाम कंठीं राहे ॥4॥ तुका ह्मणे नको काबाडाचे भरी । पडों सार धरीं हें चि एक ॥5॥ 2320 सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥1॥ त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥ आहे हा आधार। नाम त्याचें विश्वंभर ॥2॥ नाही रिता ठाव । तुका ह्मणे पसरीं भाव॥3॥ 2321 संकोचोनि काय जालासी लहान । घेइप अपोशण ब्रह्मांडाचें ॥1॥ करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥ घरकुलानें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥2॥ झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका ह्मणे वाखे कौतुकाचे ॥3॥ 2322 माझ्या बापें मज दिधलें भातुकें । ह्मणोनि कवतुकें क्रीडा करीं ॥1॥ केली आळी पुढें बोलिलों वचन । उत्तम हें Yाान आलें त्याचें ॥ध्रु.॥ घेऊनि विभाग जावें लवलाहा । आलेति या ठाया आपुलिया ॥2॥ तुका Yाानदेवीं समुदाय । करावा मी पाय येइन वंदूं ॥3॥ 2323 Yाानियांचा गुरु राजा महाराव । ह्मणती Yाानदेव ऐसें तुह्मां ॥1॥ मज पामरा हें काय थोरपण । पायींची वाहाण पायीं बरी ॥ध्रु.॥ ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे । इतर तुळणें काय पुरे॥2॥ तुका ह्मणे नेणे युHीची ते खोलीं । ह्मणोनि ठेविली पायीं डोइऩ ॥3॥ 2324 बोलिलीं लेकुरें । वेडीं वांकुडीं उत्तरें ॥1॥ करा क्षमा अपराध । महाराज तुह्मी सिद्ध ॥ध्रु.॥ नाहीं विचारिला । अधिकार म्यां आपुला ॥2॥ तुका ह्मणे Yाानेश्वरा । राखा पायांपें किंकरा ॥3॥ 2325 काय तुह्मी जाणां । करूं अव्हेर नारायणा ॥1॥ तरी या लटिक्याची गोही । निवडली दुसरे ठायीं ॥ध्रु.॥ कळों अंतरींचा गुण । नये फिटल्यावांचून ॥2॥ आणिलें अनुभवा । जनाच्या हें Yाानदेवा ॥3॥ आणीक कोणी मिती । त्यांच्या चिंतनें विश्रांति॥4॥ तुका ह्मणे बीज पोटीं । फळ तैसें चि सेवटीं ॥5॥ 2326 अविश्वासीयाचें शरीर सुतकी । विटाळ पातकी भेद वाही ॥1॥ काय त्याचे वेल जाइऩल मांडवा । होता तैसा ठेवा आला पुढें ॥ध्रु.॥ मातेचा संकल्प व्हावा राजबिंडा । कपाळीचें धोंडा उभा ठाके । तुका ह्मणे जैसा कुचराचा दाणा । परिपाकीं अन्ना न मिळे जैसा ॥3॥ 2327. तामसाचीं तपें पापाची सिदोरी । तमोगुणें भरी घातले ते ॥1॥ राज्यमदा आड सुखाची संपित्त । उलंघूनि जाती निरयगांवा॥ध्रु.॥ इंिद्रयें दमिलीं इच्छा जिती जीवीं । नागविती ठावीं नाहीं पुढें ॥2॥ तुका ह्मणे हरिभजनावांचून । करिती तो सीण पाहों नये ॥3॥ 2328 हरिकथेवांचून इिच्छती स्वहित । हरिजन चित्त न घला तेथें ॥1॥ जाइऩल भंगोन आपुला विश्वास । होइऩल या नास कारणांचा ॥ध्रु.॥ ज्याचिया बैसावे भोजनपंगती । त्याचिया संगती तैसे खावें ॥2॥ तुका ह्मणे काय जालेसि जाणते । देवा ही परते थोर तुह्मी ॥3॥ 2329 सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥1॥ घेइऩल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जनां॥ध्रु.॥ खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥2॥ तुका ह्मणे तो Yाानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥3॥ 2330 जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ । अंगीं ऐसें बळ रेडा बोले ॥1॥ करील तें काय नव्हे महाराज । परि पाहे बीज शुद्ध अंगीं ॥ध्रु.॥ जेणें हे घातली मुHीची गवांदी । मेळविली मांदी वैष्णवांची ॥2॥ तुका ह्मणे तेथें सुखा काय उणें । राहे समाधानें चित्ताचिया ॥3॥ 2331 बहुतां छंदाचें बहु वसे जन । नये वांटूं मन त्यांच्या संगें ॥1॥ करावा जतन आपुला विश्वास । अंगा आला रस आवडीचा ॥ध्रु.॥ सुखाची समाधी हरिकथा माउली । विश्रांति साउली सिणलियांची ॥2॥ तुका ह्मणे बुडे बांधोनि दगड । तेथें काय कोड धांवायाचें ॥3॥ 2332 हरिकथे नाहीं । विश्वास ज्याचे ठायीं ॥1॥ त्याची वाणी अमंगळ । कान उंदराचें बीळ ॥ध्रु.॥ सांडुनि हा रस । करिती आणीक सायास ॥2॥ तुका ह्मणे पिसीं । वांयां गेलीं किती ऐसीं॥3॥ 2333 प्रेम अमृताची धार । वाहे देवा ही समोर ॥1॥ उर्ध्ववाहिनी हरिकथा । मुगुटमणि सकळां तीर्थां ॥ध्रु.॥ शिवाचें जीवन। जाळी महादोष कीर्तन ॥2॥ तुका ह्मणे हरि । इची स्तुति वाणी थोरी ॥3॥ 2334 आतां माझ्या मना । इची घडो उपासना ॥1॥ ऐसें करींपांडुरंगा।प्रेमवोसंडेसेंअंगा ॥ध्रु.॥ सर्व काळ नये । वाचेविट आड भये ॥2॥ तुका वैष्णवांसंगती । हें चि भजन पंगती ॥3॥ 2335 उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥1॥ आह्मी विठोबाचे दास । चिंता झुगारावी आस ॥ध्रु.॥ भHीच्या उत्कषॉ । नाहीं मुHीचें तें पिसें ॥2॥ तुका ह्मणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥3॥ 2336 करविली तैसी केली कटकट । वांकडें कीं नीट देव जाणे ॥1॥ कोणाकारणें हें जालेंसे निर्माण । देवाचें कारण देव जाणे ॥2॥ तुका ह्मणे मी या अभिमाना वेगळा । घालुनि गोपाळा भार असें ॥3॥ 2337 तुह्मी येथें पाठविला धरणेकरी । त्याची जाली परी आइका ते ॥1॥ आतां काय पुढें वाढवुनि विस्तार । जाला समाचार आइका तो ॥ध्रु.॥ देवाचें उचित एकादश अभंग । महाफळ त्याग करूनि गेला ॥2॥ तुका ह्मणे सेवा समर्पूनि पायीं । जालों उतराइऩ ठावें असो ॥3॥ ॥31॥ 2338 मरण माझें मरोन गेलें । मज केलें अमर ॥1॥ ठाव पुसिलें बुड पुसिलें । वोस वोसलें देहभावा ॥ध्रु.॥ आला होता गेला पूर । धरिला धीर जीवनीं ॥2॥ तुका ह्मणे बुनादीचें । जालें साचें उजवणें ॥3॥ 2339 माझे लेखीं देव मेला । असो त्याला असेल ॥1॥ गोष्टी न करी नांव नेघें । गेलों दोघें खंडोनी ॥ध्रु.॥ स्तुतिसमवेत निंदा । केला धंदा उदंड ॥2॥ तुका ह्मणे निवांत ठेलों । वेचित आलों जीवित्व ॥3॥ 2340 लवविलें तया सवेें लवे जाती । अभिमाना हातीं सांपडेना ॥1॥ भोिळवेचें लेणें विष्णुदासां साजे । तेथें भाव दुजे हारपती ॥ध्रु.॥ अर्चन वंदन नवविधा भिH । दया क्षमा शांति ठायीं ॥2॥ तये गांवीं नाहीं दुःखाची वसती । अवघा चि भूतीं नारायण ॥3॥ अव घें चि जालें सोंवळें ब्रह्मांड । विटाळाचें तोंड न देखती ॥4॥ तुका ह्मणे गाजे वैकुंठीं सोहळा । याही भूमंडळामाजी कीतिऩ ॥5॥ 2341 पंढरीची वारी आहे माझे घरीं । आणीक न करीं तीर्थव्रत ॥1॥ व्रत एकादशी करीन उपवासी । गाइन अहनिऩशीं मुखीं नाम ॥2॥ नाम विठोबाचें घेइऩन मी वाचे । बीज कल्पांतींचें तुका ह्मणे ॥3॥ 2342 संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥1॥ जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥2॥ तुका ह्मणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥3॥ 2343 कथनी पठणी करूनि काय । वांचुनि रहणी वांयां जाय ॥1॥ मुखीं वाणी अमृतगोडी । मिथ्या भुकें चरफडी ॥ध्रु.॥ पिळणी पाक करितां दगडा । काय जडा होय तें ॥2॥ मधु मेळवूनि माशी । आणिका सांसी पारधिया ॥3॥ मेळऊनि धन मेळवी माती । लोभ्या हातीं तें चि मुखीं ॥4॥ आपलें केलें आपण खाय । तुका वंदी त्याचे पाय ॥5॥ 2344 उमटती वाणी । वाटे नामाचिया ध्वनी ॥1॥ बरें सेवन उपकारा । द्यावें द्यावें या उत्तरा ॥ध्रु.॥ सरळ आणि मृद । कथा पाहावी तें उर्ध ॥2॥ गात जात तुका । हा चि उपदेश आइका॥3॥ 2345 कथाकाळींची मर्यादा सांगतों ते भावें वंदा । प्रीतीने गोविंदा हें चि एक आवडे ॥1॥ टाळ वाद्या गीत नृत्य अंतःकरणें प्रेमभरित । वाणिता तो कीर्त तद्भावने लेखावा ॥ध्रु.॥ नये अळसें मोडूं अंग कथे कानवडें हुंग । हेळणेचा रंग दावी तो चांडाळ ॥2॥ तोंडी विडा माने ताठा थोरपणे धाली गेंठा । चित्त नेदी नामपाठा गोष्टी लावी तो चांडाळ ॥4॥ कथे इच्छी मान दावूनियां थोरपण रजा संकोच न लुगडी सांवरी तो चांडाळा ॥4॥ आपण बैसे बाजेवरी सामान हरिच्या दासां धरी । तरि तो सुळावरि वाहिजे निश्चयेसीं ॥5॥ येतां नकरी नमस्कार कर जोडोनियां नम्र । न म्हणवितां थोर आणिकां खेटी तो चांडाळ ॥6॥ तुका विनवी जना कथे नाणावें अवगुणा । करा नारायणा ॠणी समर्पक भावें ॥7॥ 2346 कथा देवाचें ध्यान । कथा साधना मंडण । कथे ऐसें पुण्य आणीक नाहीं सर्वथा ॥1॥ ऐसा साच खरा भाव । कथेमाजी उभा देव ॥ध्रु.॥ मंत्र स्वल्प जना उच्चारितां वाचे मना । म्हणतां नारायणा क्षणें जळती महा दोष ॥2॥ भावें करितां कीर्तन तरे तारी आणीक जन । भेटे नारायण संदेह नाहीं ह्मणे तुका ॥3॥ 2347 कथा त्रिवेणीसंगम देव भH आणि नाम । तेथींचें उत्तम चरणरज वंदितां ॥1॥ जळती दोषांचे डोंगर शुद्ध होती नारी नर । गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा ॥ध्रु.॥ तीथॉ तया ठाया येती पुनीत व्हावया । पर्वकाळ पायां तळीं वसे वैष्णवां॥2॥ अनुपम्य हा महिमा नाहीं द्यावया उपमा । तुका ह्मणे ब्रह्मा नेणे वणूप या सुखा ॥3॥ 2348 सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥1॥ आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥ टाळी वाहूनियां विठ्ठल ह्मणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥2॥ तुका ह्मणे देवा नुपेक्षावें आह्मां । न्यावें निजधामा आपुलिया ॥3॥ 2349 जळती कीर्तनें दोष पळतील विघ्नें ॥1॥ हें चि बिळवंत गाढें । आनंद करूं दिंडीपुढें ॥ध्रु.॥ किळ पापाची हे मूतिऩ। नामखड्ग घेऊं हातीं ॥2॥ तुका ह्मणे जाऊं । बळें दमामे ही लावूं ॥3॥ 2350 यम सांगे दूतां तुह्मां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥1॥ नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥ चक्र गदा घेउनी हरि उभा असे त्यांचे द्वारीं । लIमी कामारी रििद्धसिद्धीसहित ॥2॥ ते बिळयाशिरोमणी हरिभH ये मेदिनी । तुका ह्मणे कानीं यम सांगे दूतांचे ॥3॥ 2351 कान्हया रे जगजेठी । देइप भेटी एकवेळे ॥1॥ काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥ येथवरी होता संग । अंगें अंग लपविलें ॥2॥ तुका ह्मणें पाहिलें मागें । एवढएा वेगें अंतरला ॥3॥ 2352 आपुल्या आह्मी पुसिलें नाही । तुज कांहीं कारणें॥1॥ मागें मागें धांवत आलों । कांहीं बोलों यासाटीं ॥ध्रु.॥ बहुत दिस होतें मनीं । घ्यावी धणी एकांतीं ॥2॥ तुका ह्मणे उभा राहें । कान्हो पाहें मजकडे ॥3॥ 2353 धन्य बा हएा ऐशा नारी । घरीं दारीं नांदती ॥1॥ चोरूनिया तुजपाशीं । येतां त्यांसी न कळतां ॥ध्रु.॥ दोन्हीं ठायीं समाधान । सम कठीण बहुतचि ॥2॥ तुका ह्मणे जीवासाठीं । दुर्लभ भेटी ते देवा ॥3॥ 2354 उदासीना पावल्या वेगीं । अंगा अंगीं जडलिया॥1॥ वेटािळला भोंवता हरी । मयोरफेरीं नाचती ॥ध्रु.॥ मना आले करिती चार । त्या फार हा एकला ॥2॥ तुका ह्मणे नारायणीं । निराजनी मीनलिया ॥3॥ 2355 विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥1॥ ह्मणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥ दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ।2॥ तुका ह्मणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥3॥ 2356 आलिंगन कंठाकंठीं । पडे मिठी सर्वांगें ॥1॥ न घडे मागें परतें मन । नारायण संभोगी ॥ध्रु.॥ वचनासी वचन मिळे। रिघती डोळे डोिळयांत ॥2॥ तुका ह्मणे अंतर्ध्यानीं । जीव जीवनीं विराल्या ॥3॥ 2357 कोणी सुना कोणी लेंकी । कोणी एकी सतंता ॥1॥ अवघियांची जगनिंद । जाली धिंद सारखी ॥ध्रु.॥ अवघ्या अवघ्या चोरा । विना वरा मायबापा ॥2॥ तुका ह्मणे करा सेवा । आलें जीवावर तरी ॥3॥ 2358 येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥1॥ ती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥ अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥2॥ तुका ह्मणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥3॥ ॥8॥ 2359 चिंता नाहीं गांवीं विष्णुदासांचिये । घोष जयजयकार सदा ॥1॥ नारायण घरीं सांठविलें धन । अवघे चि वाण तया पोटीं ॥ध्रु.॥ सवंग सकळां पुरे धणीवरी । सेवावया नारी नर बाळा॥2॥ तुका ह्मणे येणें आनंदी आनंदु । गोविंदें गोविंदु पिकविला॥3॥ 2360 करिती तया वेवसाव आहे । येथें व्हा रे साहे एकां एक ॥1॥ गातां आइकतां समान चि घडे । लाभें लाभ जोडे विशेषता ॥ध्रु.॥ प्रेमाचें भरतें भातें घ्यावें अंगीं । नटे टाळी रंगीं शूरत्वेंसी ॥2॥ तुका ह्मणे बहुजन्मांचे खंडण । होइल हा सीण निवारोनि ॥3॥ ॥2॥ 2361 नाहीं घाटावें लागत । एका सितें कळें भात ॥1॥ क्षीर निवडितें पाणी । चोंची हंसाचिये आणी ॥ध्रु.॥ आंगडें फाडुनि घोंगडें करी । अवकळा तये परी ॥2॥ तुका ह्मणे कण । भुसीं निवडे कैंचा सीण ॥3॥ स्वामीचें अभंगींचें नांव काढून सालोमालो आपलें नांव घालीत त्यावर अभंग ॥ 8 ॥ 2362 सालोमालो हरिचे दास । ह्मणउन केला अवघा नास॥1॥ अवघें बचमंगळ केलें । ह्मणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥ मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥2॥ तुका ह्मणे कवी । जगामधीं रूढ दावी ॥3॥ 2363 जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥1॥ त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे ब†या वोजा ॥ध्रु.॥ अभिलाषाच्या सुखें। अंतीं होती काळीं मुखें ॥2॥ तुका ह्मणे चोरा । होय भूषण मातेरा ॥3॥ 2364 कालवूनि विष । केला अमृताचा नास ॥1॥ ऐशा अभाग्याच्या बुिद्ध । सत्य लोपी नाहीं शुिद्ध ॥ध्रु.॥ नाक कापुनि लावी सोनें । कोण अळंकार तेणें ॥2॥ तुका ह्मणे बावी । मोडूनि मदार बांधावी ॥3॥ 2365 कण भुसाच्या आधारें । परि तें निवडितां बरें ॥ काय घोंगालि पाधाणी । ताकामध्यें घाटी लोणी ॥ध्रु.॥ सुइणीपुढें चेंटा । काय लपविसी चाटा ॥2॥ तुका ह्मणे Yाान । दिमाकाची भनभन ॥3॥ 2366 विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥1॥ हा तो निवाडएाचा ठाव । ख†या खोटएा निवडी भाव ॥ध्रु.॥ ग†हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥2॥ लावूं जाणे विल्हे। तुका साच आणिक कल्हे ॥3॥ 2367 विषयीं अद्वये । त्यासी आह्मां सिवो नये ॥1॥ देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥ वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रह्मिस्थति ॥2॥ तुका ह्मणे असतां देहीं । तेथें नाही जेमेतीं ॥3॥ 2368 नमितों या देवा । माझी एके ठायीं सेवा ॥1॥ गुणअवगुण निवाडा । ह्मैस ह्मैस रेडा रेडा ॥ध्रु.॥ जनीं जनादऩन। साक्ष त्यासी लोटांगण ॥2॥ तुका ह्मणे खडे । निवडू दळणीं घडघडे ॥3॥ ॥8॥ 2369 जीव जीती जीवना संगें । मत्स्या मरण त्या वियोगें॥1॥ जया चित्तीं जैसा भाव । तयां जविळ तैसा देव ॥ध्रु.॥ सकळां पाडीये भानु । परि त्या कमळाचें जीवनु ॥2॥ तुका ह्मणे माता । वाहे तान्हे याची चिंता ॥3॥ 2370 मुंगीचिया घरा कोण जाय मूळ । देखोनियां गूळ धांव घाली ॥1॥ याचकाविण काय खोळंबला दाता । तोचि धांवे हिता आपुलिया ॥ध्रु.॥ उदक अन्न काये ह्मणे मज खा ये । भुकेला तो जाये चोजवीत ॥2॥ व्याधी पिडिला धांवे वैद्याचिया घरा । दुःखाच्या परिहारा आपुलिया ॥3॥ तुका ह्मणे जया आपुलें स्वहित। करणें तो चि प्रीत धरी कथे ॥4॥ 2371 जन्मांतरिंचा परिट न्हावी । जात ठेवी त्यानें तें॥1॥ वाखर जैसा चरचरी । तोंड करी संव दणी ॥ध्रु.॥ पूर्व जन्म शिखासूत्र । मळ मूत्र अंतरीं ॥2॥ तुका ह्मणे करिती निंदा । धुवटधंदा पुढिलांचा ॥3॥ 2372 नाम दुसी त्याचें नको दरषण । विष तें वचन वाटे मज ॥2॥ अमंगळ वाणी नाइकवे कानीं । निंदेची पोहोणी उठे तेथें॥ध्रु.॥ काय लभ्य त्याचिये वचनीं । कोणत्या पुराणीं दिली ग्वाही ॥2॥ काय आड लावूं त्याचिया तोंडासी । आतां या जिभेसी काय करूं ॥3॥ तुका ह्मणे संत न मनिती त्यांस । घेऊं पाहे ग्रास यमदूत ॥4॥ 2373 येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥1॥ उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥ बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥2॥ तुका ह्मणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥3॥ 2374 नव्हे जोखाइऩ जोखाइऩ । मायराणी मेसाबाइऩ ॥1॥ बिळया माझा पंढरिराव । जो या देवांचा ही देव ॥ध्रु.॥ रंडी चंडी शिH । मद्यमांस भिक्षती ॥2॥ बहिरव खंडेराव । रोटीसुटीसाटीं देव ॥3॥ गणोबा विक्राळ । लाडुमोदकांचा काळ ॥4॥ मुंज्या ह्मैसासुरें । हें तों कोण लेखी पोरें ॥5॥ वेताळें फेताळें । जळो त्यांचें तोंड काळें ॥6॥ तुका ह्मणे चित्तीं । धरा रखुमाइऩचा पती॥7॥ 2375 पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥1॥ मग तो होऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळती विघ्नें ॥2॥ तुका ह्मणे प्राण । करा देवासी अर्पण ॥3॥ 2376 मायें मोकलिलें कोठें जावें बळें । आपुलिया बळें न वंचे तें ॥1॥ रुसोनियां पळे सांडुनियां ताट । मागें पाहे वाट यावें ऐसीं ॥ध्रु.॥ भांडवल आह्मां आळी करावी हे । आपणें माये धांवसील ॥2॥ तुका ह्मणे आळी करुनियां निकी । देसील भातुकीं बुझाऊनि ॥3॥ 2377 नागर गोडें बाळरूप । तें स्वरूप काळीचें ॥1॥ गाइऩगोपाळांच्या संगें । आलें लागें पुंडलीका ॥ध्रु.॥ तें हें ध्यान दिगांबर । कटीं कर मिरवती ॥2॥ नेणपणे उगें चि उभें । भिHलोभें राहिलें ॥3॥ नेणे वरदळाचा मान । विटे चरण सम उभें ॥4॥ सहज कटावरी हात । दहींभात शिदोरी ॥5॥ मोहरी पांवा गांजिवा पाठीं । धरिली काठी ज्या काळें ॥6॥ रम्य स्थळ चंद्रभागा । पांडुरंगा क्रीडेसी ॥7॥ भीमा दक्षणमुख वाहे । दृष्टी पाहे समोर॥8॥ तारावेसे मूढ लोक । दिली भाक पुंडलिका ॥9॥ तुका ह्मणे वैकुंठवासी । भHांपासीं राहिला ॥10॥ 2378 विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥1॥ तयासी बोलतां होइऩल विटाळ । नेव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥ विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥2॥ तुका ह्मणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥3॥ 2379 तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम॥1॥ कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें। रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥ फळ पावाल अवलिळा । भोग वैकुंठ सोहळा ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या नांवें । तो चि होइजेल स्वभावें॥3॥ 2380 पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥1॥ मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥ जें निंदिलें शास्त्रें । वंद्य जालें नाममात्रें ॥2॥ तुका ह्मणे ऐसा । त्रिभुवनीं नामठसा ॥3॥ 2381 नाम घेतां न लगे मोल । नाममंत्र नाहीं खोल ॥1॥ दों अक्षरांचें काम । उच्चारावें राम राम ॥ध्रु.॥ नाहीं वर्णाधमयाती। नामीं अवघीं चि सरतीं ॥2॥ तुका ह्मणे नाम । चैतन्य निजधाम॥3॥ 2382 नाम घेतां वांयां गेलां । ऐसा कोणें आइऩिकला ॥1॥ सांगा विनवितों तुह्मांसी । संत महंत सिद्ध ॠषी ॥ध्रु.॥ नामें तरला नाहीं कोण । ऐसा द्यावा निवडून ॥2॥ सलगीच्या उत्तरा । तुका ह्मणे क्षमा करा ॥3॥ 2383 फुकाचें तें लुटा सार । व्हा रे अमर सदैव ॥1॥ नाहीं गर्भवास पुढती । डोंगर जळती दोषांचे ॥ध्रु.॥ उदंड भावें उदंड घ्यावें । नाम गावें आवडी ॥2॥ तुका ह्मणे घरिच्या घरीं । देशा उरीं न सीणीजे ॥3॥ ॥15॥ 2384 प्रीति नाही राया वजिऩली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥1॥ तैसे दंभी जालों तरी तुझे भH । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥ राजयाचा पुत्र अपराधी देखा । तो काय आणिकां दंडवेल ॥2॥ बाहातरी खोडी परी देवमण कंठीं । तैसो जगजेठी ह्मणे तुका ॥3॥ 2385 करावा उद्धार किंवा घ्यावी हारी । एका बोला िस्थरी राहें देवा ॥1॥ निरसनें माझा होइऩल संदेह । अवघें चि आहे मूळ पायीं ॥ध्रु.॥ राहिलों चिकटूण कांहीं चि न कळे । कोणा नेणों काळे उदय भाग्य ॥2॥ तुका ह्मणे बहु उद्वेगला जीव । भाकीतसें कीव देवराया ॥3॥ ॥1॥ 2386 आलिया भोगासी असावें सादर । देवावरी भार घालूनियां ॥1॥ मग तो कृपासिंधु निवारी सांकडें । येर तें बापुडें काय रंके ॥ध्रु.॥ भयाचिये पोटीं दुःखाचिया रासी । शरण देवासी जातां भले ॥2॥ तुका ह्मणे नव्हे काय त्या करितां । चिंतावा तो आतां विश्वंभर ॥3॥ 2387 भोग तो न घडे संचितावांचूनि । करावें तें मनीं समाधान ॥1॥ ह्मणऊनी मनीं मानूं नये खेदु । ह्मणावा गोविंद वेळोवेळां ॥ध्रु.॥ आणिकां रुसावें न लगे बहुतां । आपुल्या संचितावांचूनियां ॥2॥ तुका ह्मणे भार घातलिया वरी । होइऩल कैवारी नारायण ॥3॥ 2388 निर्वैर व्हावें सर्वभूतांसवें । साधन बरवें हें चि एक॥1॥ तरी च अंगीकार करिल नारायण । बडबड तो सीण येणेंविण ॥ध्रु.॥ सोइरें पिशुन समान चि घटे । चित्त पर ओढे उपकारी ॥2॥ तुका ह्मणे चित्त जालिया निर्मळ । तरि च सकळ केलें होय ॥3॥ 2389 दिली चाले वाचा । क्षय मागिल्या तपाचा ॥1॥ रििद्ध सििद्ध येती घरा । त्याचा करिती पसारा ॥ध्रु.॥ मानदंभांसाटीं। पडे देवासवें तुटी ॥2॥ तुका ह्मणे मेवा । कैचा वेठीच्या नदवां॥3॥ 2390 तापल्यावांचून नव्हे अळंकार । पिटूनियां सार उरलें तें ॥1॥ मग कदाकाळीं नव्हे शुद्ध जाति । नासें शत्रु होती मित्र ते चि ॥ध्रु.॥ किळवर बरें भोगूं द्यावें भोगा । फांसिलें तें रोगा हातीं सुटे ॥2॥ तुका ह्मणे मन करावें पाठेळ । साहावे चि जाळ सिजेवरि ॥3॥ 2391 पाठेळ करितां न साहावे वारा । साहेलिया ढोरा गोणी चाले ॥1॥ आपणां आपण हे चि कसवटी । हर्षामर्ष पोटीं विरों द्यावें ॥ध्रु.॥ नवनीत तोंवरी कडकडी लोणी । निश्चळ होऊनी राहे मग ॥2॥ तुका ह्मणे जरी जग टाकी घाया । त्याच्या पडे पायां जन मग ॥3॥ 2392 काविळयासी नाहीं दया उपकार । कािळमा अंतर विटाळसें ॥1॥ तैसें कुधनाचें जिणें अमंगळ । घाणेरी वोंगळ वदे वाणी ॥ध्रु.॥ कडु भोंपऑयाचा उपचारें पाक । सेविल्या तिडीक कपाळासी ॥2॥ तुका ह्मणे विष सांडूं नेणे साप । आदरें तें पाप त्याचे ठायीं ॥3॥ 2393 लाभ खरा नये तुटी । नाहीं आडखळा भेटी ॥1॥ जाय अवघिया देशा । येथें संचलाची तैसा ॥ध्रु.॥ मग न लगे पारखी। अवघीं सकट सारखीं । तुका ह्मणे वोळे । रूपें भुलविले डोळे ॥3॥ 2394. नको आतां पुसों कांहीं । लवलाहीं उसंती ॥1॥ जाय वेगीं पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥ध्रु.॥ वचनाचा न करीं गोवा । रिघें देवासीं शरण ॥2॥ तुका ह्मणे कृपावंता । बहु चिंता दीनाची ॥3॥ 2395 बुिद्धहीनां जडजीवां । नको देवा उपेक्षूं ॥1॥ परिसावी हे विYाापना । आह्मां दीनां दासांची ॥ध्रु.॥ चिंतूनियां आले पाय । त्यांसी काय वंचन ॥2॥ तुका ह्मणे पुरुषोत्तमा । करीं क्षमा अपराध॥3॥ 2396 ह्मणऊनि काकुळती । येतों पुढतों पुढती । तुह्मां असे हातीं । कमळापती भांडार ॥1॥ फेडूं आलेती दरिद्र । तरी न लगे उशीर । पुरे अभयंकर । ठाया ठाव रंकाशी ॥ध्रु.॥ कोठें न घली धांव । याजसाठीं तजिली हांव । घेऊं नेदी वाव । मना केला विरोध ॥2॥ कारणांच्या गुणें । वेळ काळ तोही नेणें । तुमच्या कीर्तनें । तुका तुह्मां जागवी ॥3॥ 2397 बहु नांवें ठेविलीं स्तुतीचे आवडी । बहुत या गोडी आली रसा ॥1॥ बहु सोसें सेवन केलें बहुवस । बहु आला दिस गोमटएाचा ॥ध्रु.॥ बहुतां पुरला बहुतां उरला । बहुतांचा केला बहु नट ॥2॥ बहु तुका जाला निकट वृत्ती । बहु काकुलती येऊनियां॥3॥ 2398 येहलोकीं आह्मां वस्तीचें पेणें । उदासीन तेणें देहभावीं॥1॥ कार्यापुरतें कारण मारगीं । उलंघूनि वेगीं जावें स्थळा ॥ध्रु.॥ सोंगसंपादणी चालवितों वेव्हार । अत्यंतिक आदर नाहीं गोवा ॥2॥ तुका ह्मणे वेंच लाविला संचिता । होइल घेतां लोभ कोणां ॥3॥ 2399 रोजकीदव जमा धरुनी सकळ । खताविला काळ वरावरी ॥1॥ नाहीं होत झाडएापाडएाचें लिगाड । हुजराती ते गोड सेवा रूजू ॥ध्रु.॥ चोरासाटीं रदबदल आटा हाश । जळो जिणे दाश बहुताचें ॥2॥ सावधान तुका निर्भर मानसीं । सालझाडएापाशी गुंपों नेणे ॥3॥ 2400 त्रिविधकर्माचे वेगळाले भाव । निवडूनि ठाव दाखविला॥1॥ आलियाचा झाडा राहिल्याचा ठाव । सुख गौरव संतां अंगीं ॥ध्रु.॥ हिशेबें आलें तें सकळांसी प्रमाण । तेथें नाही आन चालों येत ॥2॥ तुका ह्मणे नाहीं पापपुण्य खतीं । झाडएाची हुजती हातां आली ॥3॥ py5guojgpk2cw7at5zgultnb4msoiwu तुकाराम गाथा/ २४०१ ते २७०० 0 1541 36904 36880 2026-09-19T19:41:49Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36904 wikitext text/x-wiki 2401 साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आह्मां जोडी वैष्णवांची ॥1॥ मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥ भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आह्मांसि तरी खेळावरि चित्त ॥2॥ तुका ह्मणे आह्मी देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥3॥ 2402 सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥1॥ पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे॥ध्रु.॥ हरिदासांचा समागम। अंगीं प्रेम विसांवे ॥2॥ तुका ह्मणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥3॥ 2403 करूं जातां सन्निधान । क्षणि जन पालटे ॥1॥ आतां गोमटे ते पाय । तुझे माय विठ्ठले ॥ध्रु.॥ हें तों आलें अनुभवा । पाहावें जीवावरूनि ॥2॥ तुका ह्मणे केला त्याग । सर्वसंग ह्मणऊनि ॥3॥ 2404 क्षीर मागे तया रायतें वाढी । पाधानी गधडी ऐशा नांवें ॥1॥ समयो जाणां समयो जाणां । भलतें नाणां भलतेथें॥ध्रु.॥ अमंगळ वाणी वदवी मंगळी । अशुभ वोंगळी शोभन तें ॥2॥ तुका ह्मणे नेणें समयो ठाया ठाव । राहाडी ते वाव नरकाडी ॥3॥ 2405 विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥1॥ केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥ मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥2॥ तुका ह्मणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥3॥ 2406 तीथाअची अपेक्षा स्थळीं वाढे धर्म । जाणावें तें वर्म बहु पुण्य ॥1॥ बहु बरी ऐसी भाविकांची जोडी । काळ नाहीं घडी जात वांयां ॥ध्रु.॥ करूनी चिंतन करवावें आणिकां । तो या जाला लोकां नाव जगीं ॥2॥ तुका ह्मणे ऐसे परउपकारी । त्यांच्या पायांवरी डोइऩ माझी ॥3॥ 2407 भयाची तों आह्मां चिंत्तीं । राहो खंती सकेना ॥1॥ समपिऩलों जीवें भावें । काशा भ्यावें कारणें ॥ध्रु.॥ करीन तें कवतुकें। अवघें निकें शोभेल ॥2॥ तुका ह्मणे माप भरूं । दिस सारूं कवतुकें ॥3॥ 2408 पाचारितां धावे । ऐसी ठायींची हे सवे ॥1॥ बोले करुणा वचनीं । करी कृपा लावी स्तनीं ॥ध्रु.॥ जाणे कळवळा । भावसिद्धींचा जिव्हाळा ॥2॥ तुका ह्मणे नाम । मागें मागें धांवे प्रेम॥3॥ 2409 कां जी माझे जीवीं । आळस ठेविला गोसावीं ॥1॥ येवढा घात आणीक काय । चिंतनासी अंतराय ॥ध्रु.॥ देहआत्म वंदी । केला घात कुबुद्धी ॥2॥ तुका ह्मणे मन । कळवळी वाटे सीण ॥3॥ 2410 दर्शनाचें आर्त जीवा । बहु देवा राहिलें ॥1॥ आतां जाणसी तें करीं । विश्वंभरीं काय उणें ॥ध्रु.॥ येथें जरी उरे चिंता । कोण दाता याहूनी ॥2॥ तुका ह्मणे जाणवलें । आह्मां भलें एवढेंच॥3॥ 2411 बैसों पाठमोरीं । मना वाटे तैसे करीं ॥1॥ परिं तूं जाणसीं आवडीं । बाळा बहुतांचीं परवडी ॥ध्रु.॥ आपुलाल्या इच्छा। मागों जया व्हावें जैशा ॥2॥ तुका ह्मणे आइऩ । नव्हसी उदास विठाइऩ ॥3॥ 2412 विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥1॥ जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥ जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥2॥ तुका ह्मणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥3॥ 2413 दाटे कंठ लागे डोिळयां पाझर । गुणाची अपार वृिष्ट वरी ॥1॥ तेणें सुखें छंदें घेइऩन सोंहळा । होऊनि निराळा पापपुण्यां॥ध्रु.॥ तुझ्या मोहें पडो मागील विसर । आलापें सुस्वर करिन कंठ ॥2॥ तुका ह्मणे येथें पाहिजे सौरस । तुह्मांविण रस गोड नव्हे॥3॥ 2414 पसरूनि राहिलों बाहो । सोयी अहो तुमचिये ॥1॥ आतां यावें लागवेगें । पांडुरंगे धांवत ॥ध्रु.॥ बैसायाची इच्छा कडे। चाली खडे रुपताती ॥2॥ तुका ह्मणे कृपाळुवा । करीन सेवा लागली ॥3॥ 2415 आह्मी जालों एकविध । सुद्या सुदें असावें ॥1॥ यावरी तुमचा मोळा । तो गोपाळा अकळ ॥ध्रु.॥ घेतलें तें उसणें द्यावें । कांहीं भावें विशेषें ॥2॥ तुका ह्मणे क्रियानष्ट । तरी कष्ट घेतसां ॥3॥ 2416 आह्मी आर्तभूत जिवीं । तुह्मी गोसावी तों उदास॥1॥ वादावाद समर्थाशीं । काशानशीं करावा ॥ध्रु.॥ आह्मी मरों वेरझारीं। स्वामी घरीं बैसले ॥2॥ तुका ह्मणे करितां वाद । कांहीं भेद कळेना॥3॥ 2417 पुसावें तें ठाइऩ आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥1॥ येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अYाान तें ॥ध्रु.॥ फळ तें चि बीज बीज तें ची फळ । उपनांवें मूळ न पालटे ॥2॥ तुका ह्मणे अवघे गव्हांचे प्रकार । सोनें अलंकार मिथ्या नांव ॥3॥ 2418 माझी आतां सत्ता आहे । तुह्मां पायां हे वरती ॥1॥ एकाविण नेणें दुजा । पंढरिराजा सर्वांगें ॥ध्रु.॥ पुरवावी केली आळी । जे जे काळीं मागण तें ॥2॥ तुका ह्मणे सुटसी कैसा । धरूनि दिशा राहिलों ॥3॥ 2419 फावलें तुह्मां मागें । नवतों लागें पावलों ॥1॥ आलों आतां उभा राहें । जवळी पाहें सन्मुख ॥ध्रु.॥ घरीं होती गोवी जाली । कामें बोली न घडे चि ॥2॥ तुका ह्मणे धडफुडा । जालों झाडा देइप देवा ॥3॥ 2420 आतां नये बोलों अव्हेराची मात । बाळावरि चित्त असों द्यावें ॥1॥ तुज कां सांगणें लागे हा प्रकार । परि हें उत्तर आवडीचें ॥ध्रु.॥ न वंचीं वो कांहीं एकही प्रकार । आपणां अंतर नका मज ॥2॥ तुका ह्मणे मोहो राखावा सतंत । नये पाहों अंत पांडुरंगा ॥3॥ 2421 करूनि राहों जरी आत्मा चि प्रमाण । निश्चळ नव्हे मन काय करूं ॥1॥ जेवलिया विण काशाचे ढेंकर । शब्दाचे प्रकार शब्द चि ते ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां तुमचें ब्रह्मYाान । आह्मासी चरण न सोडणें ॥2॥ विरोधें विरोध वाढे पुढतोपुढती । वासनेचे हातीं गर्भवास ॥3॥ सांडीमांडीअंगीं वसे पुण्यपाप । बंधन संकल्प या चि नांवें ॥4॥ तुका ह्मणे नाहीं मुHता मोकळी । ऐसा कोण बळी निरसी देह ॥5॥ 2422 तुमचे स्तुतियोग्य कोटें माझी वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ भिHभाग्य तरी नेदीं तुळसीदळ । जोडूनि अंजुळ उभा असें ॥ध्रु.॥ कैचें भाग्य ऐसें पाविजे संनिध । नेणें पाळूं विध करुणा भाकीं ॥2॥ संतांचे सेवटीं उिच्छष्टाची आस । करूनियां वास पाहातसें ॥3॥ करीं इच्छा मज ह्मणोत आपुलें । एखादिया बोलें निमित्याच्या ॥4॥ तुका ह्मणे शरण आलों हें साधन । करितों चिंतन रात्रदिवस ॥5॥ 2423 सर्वविशीं आह्मीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥1॥ पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥ नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥2॥ केला लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥3॥ कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥4॥ तुका ह्मणे लाभ घेतला पालवीं। आतां नाहीं गोवी कशाची ही ॥5॥ 2424 येणें मुखें तुझे वणाअ गुण नाम । तें चि मज प्रेम देइप देवा ॥1॥ डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देइप देवा ॥ध्रु.॥ कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देइऩ देवा ॥2॥ वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देइप हातांस पायां बळ॥3॥ तुका ह्मणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥4॥ 2425 तूं माझा मायबाप सकळ वित्त गोत । तूं चि माझें हित करिता देवा ॥1॥ तूं चि माझा देव तूं चि माझा जीव । तूं चि माझा भाव पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं चि माझा आचार तूंचि माझा विचार। तूं चि सर्व भार चालविसी ॥2॥ सर्व भावें मज तूं होसी प्रमाण । ऐसी तुझी आण वाहातुसें ॥3॥ तुका ह्मणे तुज विकला जीवभाव। कळे तो उपाव करीं आतां ॥4॥ 2426 वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा॥1॥ गेले मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥ गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥2॥ कांहीं एक तुझा न देखों आधार । ह्मणऊनी धीर नाहीं जीवा ॥3॥ तुका ह्मणे तूं ब्रह्मांडाचा जीव । तरी कां आह्मी कींव भाकीतसों ॥4॥ 2427 असोत हे तुझे प्रकार सकळ । काय खळखळ करावी हे ॥1॥ आमुचें स्वहित जाणतसों आह्मी । तुझें वर्म नामीं आहे तुझ्या ॥ध्रु.॥ विचारितां आयुष्य जातें वांयांविण । रोज जन्मा गोवण पडतसे ॥2॥ राहेन मी तुझे पाय आठवूनी । आणीक तें मनीं येऊं नेदीं ॥3॥ तुका ह्मणे येथें येसी अनायासें । थोर तुज पिसें कीर्तनाचें ॥4॥ 2428 विष्णुदासां भोग । जरी आह्मां पीडी रोग ॥1॥ तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुह्मांसी सांगणें ॥ध्रु.॥ आह्मां काळें खावें । बोलिलें तें वांयां जावें ॥2॥ तुका ह्मणे दास । आह्मी भोगूं गर्भवास ॥3॥ 2429 भावें गावें गीत । शुद्ध करूनियां चित्त ॥1॥ तुज व्हावा आहे देव । तरि हा सुलभ उपाव ॥ध्रु.॥ आणिकांचे कानीं । गुण दोष मना नाणीं ॥2॥ मस्तक ठेंगणा । करी संतांच्या चरणा॥3॥ वेचीं तें वचन । जेणें राहे समाधान ॥4॥ तुका ह्मणे फार । थोडा तरी पर उपकार ॥5॥ 2430 वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदत अंतरा वज्रा- ऐसें ॥1॥ कांहीं न सहावें काशा करणें । संदेह निधान देह बळी॥ध्रु.॥ नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥2॥ तुका ह्मणे जरी गिळे अहंकार । तरी वसे घर नारायण॥3॥ 2431 नव्हो आतां जीवीं कपटवसती । मग काकुळती कोणा यावें ॥1॥ सत्याचिये मापें गांठीं नये नाड । आदि अंत गोड नारायण ॥ध्रु.॥ चोखटिया नाहीं विटाळाचा आघात । साच ते साचांत सांचा पडे ॥2॥ विचारिली वाट उसंत सीतळ । बुद्धीपुढें बळ तृणतुल्य ॥3॥ आहाराच्या घासें पचोनियां जिरे । वासना ही उरे उर्वरीत ॥4॥ तुका ह्मणे ताळा घालावा वचनीं । तूं माझी जननी पांडुरंगे ॥5॥ 2432 नव्हती हीं माझीं जायाचीं भूषणें । असे नारायणें उचित केलें ॥1॥ शब्दाच्या वोवोनी रत्नाचिया माळा । मुळींच जिव्हाळा झरवणी ॥ध्रु.॥ अर्थांतरीं असे अनुभवसेवन । परिपाकीं मन साक्ष येथें ॥2॥ तुका ह्मणे मज सरतें परतें । हें नाहीं अनंतें उरों दिलें ॥3॥ 2433 सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥1॥ उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥ तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन॥2॥ तुका ह्मणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥3॥ 2434 बोलाल या आतां आपुल्यापुरतें । मज या अनंतें गोवियेलें ॥1॥ झाडिला न सोडी हातींचा पालव । वेधी वेधें जीव वेधियेला ॥ध्रु.॥ तुमचे ते शब्द कोरडिया गोष्टी । मज सवें मिठी अंगसंगें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां होइऩल हे परी । अनुभव वरी येइऩल मग ॥3॥ 2435 जैशा तुह्मी दुरी आहां । तैशा राहा अंतरें ॥1॥ नका येऊं देऊं आळ । अंगीं गोपाळ जडलासे ॥ध्रु.॥ अवघा हा चि राखा काळ । विक्राळ चि भोंवता ॥2॥ तुका ह्मणे मज ऐशा । होतां पिशा जगनिंद्य ॥3॥ 2436 सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥1॥ जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥ जरि होय उघडी दृिष्ट । तरि गोष्टी युद्धाच्या ॥2॥ तुका ह्मणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥3॥ 2437 आडवा तो उभा । असे दाटोनियां प्रभा ॥1॥ देव नाहीं एकविध । एक भाव असे शुद्ध ॥ध्रु.॥ भेदाभेद आटी । नाहीं फार कोठें तुटी ॥2॥ तुका ह्मणे गोवा । उगवा वेव्हाराचा हेवा॥3॥ 2438 एका बोटाची निशाणी । परीपाख नाहीं मनीं ॥1॥ तरिं तें संपादिलें सोंग । कारणावांचूनियां वेंग ॥ध्रु.॥ वैष्णवांचा धर्म। जग विष्णु नेणे वर्म ॥2॥ अतिशयें पाप । तुका सत्य करी माप ॥3॥ 2439 सत्यत्वेंशीं घेणें भHीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥1॥ मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥ वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभयें करें दास सत्य तइप ॥2॥ तुका ह्मणे आधीं न करीं तांतडी । पायीं जाली जोडी तेणें शुद्ध ॥3॥ 2440 सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥1॥ मनीं भHीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥ घेइऩन जन्मांतरें। हें चि करावया खरें ॥2॥ तुका ह्मणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा॥3॥ 2441 आणितां त्या गती । हंस काउळे न होती ॥1॥ सांडा सांडा रे मठारे । येथें गांठीसवें धुरें ॥ध्रु.॥ नाकेंविण मोती । उभ्या बाजारें फजिती ॥2॥ हुकुमदाज तुका । येथें कोणी काुंफ्दों नका ॥3॥ 2442 ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥1॥ होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥ बोरामध्यें वसे अळी। अठोळीच भोंवती ॥2॥ पोटासाटीं वेंची चणे । राजा ह्मणे तोंडें मी ॥3॥ बेडकानें चिखल खावा । काय ठावा सागर ॥4॥ तुका ह्मणे ऐसें आहे । काय पाहे त्यांत तें ॥5॥ 2443 धांव धांव गरुडध्वजा । आह्मां अनाथांच्या काजा॥1॥ बहु जालों कासावीस । ह्मणोनि पाहें तुझी वास ॥ध्रु.॥ पाहें पाहें त्या मारगें । कोणी येतें माझ्या लागें ॥2॥ असोनियां ऐसा । तुज सारिखा कोंवसा ॥3॥ न लवावा उशीर । नेणों कां हा केला धीर॥4॥ तुका ह्मणे चाली । नको चालूं धांव घालीं ॥5॥ 2444 पांडुरंगे पांडुरंगे । माझे गंगे माउलिये ॥1॥ पान्हां घाली प्रेमधारा । पूर क्षीरा लोटों दे ॥ध्रु.॥ अंगें अंग मेळउनी । करीं धणी फेडाया ॥2॥ तुका ह्मणे घेइन उडएा । सांडिन कुडएा भावना॥3॥ 2445 गजइंद्र पशु आप्तें मोकलिला । तो तुज स्मरला पांडुरंगा ॥1॥ त्यासाठीं गरुड सांडुनि धांवसी । माया झळंबेसी दिनानाथा ॥ध्रु.॥ धेनु वत्सावरी झेंप घाली जैसी । तैसें गजेंद्रासी सोडविलें ॥2॥ तुका ह्मणे ब्रीद बांधलें यासाठीं । भHांसी संकटीं रक्षावया ॥3॥ 2446 चारी वेद जयासाटीं । त्याचें नाम धरा कंठीं ॥1॥ न करीं आणीक साधनें । कष्टसी कां वांयांविण ॥ध्रु.॥ अठरा पुराणांचे पोटीं । नामाविण नाहीं गोठी ॥2॥ गीता जेणें उपदेशिली। ते ही विटेवरी माउली ॥3॥ तुका ह्मणे सार धरीं । वाचे हरिनाम उच्चारीं ॥4॥ 2447 पाहातां ठायाठाव । जातो अंतरोनि देव ॥1॥ नये वाटों गुणदोषीं । मना जतन येविशीं ॥ध्रु.॥ त्रिविधदेह परिचारा । जनीं जनादऩन खरा ॥2॥ तुका ह्मणे धीरें- । विण कैसें होतें बरें॥3॥ 2448 नामसंकीर्तन साधन पैं सोपें । जळतील पापें जन्मांतरें॥1॥ न लगे सायास जावें वनांतरा । सुखें येतो घरा नारायण ॥ध्रु.॥ ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ॥2॥ रामकृष्णहरिविठ्ठलकेशवा । मंत्र हा जपावा सर्वकाळ॥3॥ याहूनि आणीक नाहीं पैं साधन । वाहातसें आण विठोबाची ॥4॥ तुका ह्मणे सोपें आहे सर्वांहूनि । शाहाणा तो धणी घेतो येथें ॥5॥ 2449 भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उिच्छष्ट तें ॥1॥ उिच्छष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥ काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥2॥ अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥3॥ तुका ह्मणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥4॥ 2450 सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी॥1॥ डोिळयांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥ आन गोड कांहीं न लगे संसारीं । राहिले अंतरीं पाय तुझे॥2॥ प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥3॥ चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका ह्मणे येणें गरुडध्वजें ॥4॥ 2451 ऐका ऐका भाविकजन । कोण कोण व्हाल ते ॥1॥ ताकिकांर्चा टाका संग । पांडुरंग स्मरा हो ॥ध्रु.॥ नका शोधूं मतांतरें। नुमगे खरें बुडाल ॥2॥ कलिमध्यें दास तुका । जातो लोकां सांगत ॥3॥ 2452 आपुलिया आंगें तोडी मायाजाळ । ऐसें नाहीं बळ कोणापाशीं ॥1॥ रांडापोरें त्याग करी कुटुंबाचा । नावरे हे वाचा आणि मन ॥ध्रु.॥ हर्षामर्ष जों हे नाहीं जों जिराले । तोंवरि हे केले चार त्यांनीं ॥2॥ मुH जालों ऐसें बोलों जाये मुखें । तुका ह्मणे दुःखें बांधला तो ॥3॥ 2453 आलिया अतीता ह्मणतसां पुढारें । आपुलें रोकडें सkव जाय ॥1॥ काय त्याचा भार घेऊनि मस्तकीं । हीनकर्मी लोकीं ह्मणावया ॥ध्रु.॥ दारीं हाका कैसें करवतें भोजन । रुची तरि अन्न कैसें देतें ॥2॥ तुका ह्मणे ध्वज उभारिला कर । ते शिH उदार काय जाली ॥3॥ 2454 जेथें लIमीचा वास । गंगा आली पापा नास ॥1॥ तें म्यां हृदयीं धरिलें । तापें हरण पाउलें ॥ध्रु.॥ सेवा केली संतजनीं। सुखें राहिले लपोनि ॥2॥ तुका ह्मणे वांकी । भाट जाली तिहीं लोकीं ॥3॥ 2455 रूपीं जडले लोचन । पायीं िस्थरावलें मन ॥1॥ देहभाव हरपला । तुज पाहातां विठ्ठला ॥ध्रु.॥ कळों नये सुखदुःख। तान हरपली भूक ॥2॥ तुका ह्मणे नव्हे परती । तुझ्या दर्शनें मागुती ॥3॥ 2456 जाणतें लेकरूं । माता लागे दूर धरूं ॥1॥ तैसें न करीं कृपावंते । पांडुरंगे माझे माते ॥ध्रु.॥ नाहीं मुHाफळा । भेटी मागुती त्या जळा ॥2॥ तुका ह्मणे लोणी । ताक सांडी निवडूनि॥3॥ 2457 तुजविण कोणां । शरण जाऊं नारायणा ॥1॥ ऐसा न देखें मी कोणी । तुजा तिहीं त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ पाहिलीं पुराणें । धांडोिळलीं दरुषणें ॥2॥ तुका ह्मणे ठायीं । जडून ठेलों तुझ्या पायीं ॥3॥ 2458 ऐसें भाग्य कइप लाहाता होइऩन । अवघें देखें जन ब्रह्मरूप ॥1॥ मग तया सुखा अंत नाहीं पार । आनंदें सागर हेलावती ॥ध्रु.॥ शांति क्षमा दया मूतिऩमंत अंगीं । परावृत्त संगीं कामादिकां ॥2॥ विवेकासहित वैराग्याचें बळ । धग्धगितोज्ज्वाळ अिग्न जैसा ॥3॥ भिH नवविधा भावशुद्ध बरी । अळंकारावरी मुगुटमणि ॥4॥ तुका ह्मणे माझी पुरवी वासना । कोण नारायणा तुजविण ॥5॥ 2459 कासया करावे तपाचे डोंगर । आणीक अपार दुःखरासी॥1॥ कासया फिरावे अनेक ते देश । दावितील आस पुढें लाभ ॥ध्रु.॥ कासया पुजावीं अनेक दैवतें । पोटभरे तेथें लाभ नाहीं ॥2॥ कासया करावे मुHीचे सायास । मिळे पंढरीस फुका साटीं ॥3॥ तुका ह्मणे करीं कीर्तन पसारा । लाभ येइऩल घरा पाहिजे तो ॥4॥ 2460 वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥1॥ प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥2॥ तुका ह्मणे हे आशीर्वादें बळी । जाइऩल तो छळी नरकायासीं ॥3॥ 2461 देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥1॥ ऐसें आवडतें मना । देवा पुरवावी वासना ॥ध्रु.॥ हरिजनासी भेटी । नहो अंगसंगें तुटी ॥2॥ तुका ह्मणे जिणें । भलें संतसंघष्टणें ॥3॥ 2462 भाग सीण गेला । माझा सकळ विठ्ठला ॥1॥ तुझा ह्मणवितों दास । केली उिच्छष्टाची आस ॥ध्रु.॥ राहिली तळमळ । तइप पासोनी सकळ ॥2॥ तुका ह्मणे धालें । पोट ऐसें कळों आलें॥3॥ 2463 रायाचें सेवक । सेवटीचें पीडी रंक ॥1॥ हा तों हिणाव कवणा । कां हो नेणां नारायणा ॥ध्रु.॥ परिसेंसी भेटी । नव्हे लोहोपणा तुटी ॥2॥ तुझें नाम कंठीं । तुक्या काळासवें भेटी॥3॥ 2464 सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥1॥ न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥ चंद्रभागे स्नान विध तो हरिकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥2॥ तुका ह्मणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥3॥ 2465 नसतां अधिकार उपदेशासी बळत्कार । तरि ते केले हो चार माकडा आणि गारूडी ॥1॥ धन धान्य राज्य बोल वृथा रंजवणें फोल । नाहीं तेथें ओल बीज वेची मूर्ख तो ॥ध्रु.॥ नये बांधों गांठी पदरा आण ऐसी तुटी । असोन कसोटी शिष्टाचारअनुभव॥2॥ उपदेसी तुका मेघ वृष्टीनें आइका । संकल्पासी धोका सहज तें उत्तम ॥3॥ 2466 घालुनियां मापीं । देवभH बैसले जपीं ॥1॥ तैसी होते सांडउलंडी । निजनिजांची मुडी ॥ध्रु.॥ अमुपीं उखतें । आपण वोस आपण यातें ॥2॥ देव आतां जाला । उगवे संकोच वहिला॥3॥ अखंड नेलें वेठी । भार सत्याविण गांठी ॥4॥ आडकिला झोंपा । रिता किळवरचा खोंपा ॥5॥ गोदातीरीं आड । करिते करविते द्वाड॥6॥ तुका ह्मणे बळें । उपदेशाचें तोंड काळें ॥7॥ 2467 उंबरांतील कीटका । हें चि ब्रह्मांड ऐसें लेखा ॥1॥ ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥ हें चि ब्रह्मांड आह्मांसी । ऐसीं अगणित अंडें कैसीं ॥2॥ विराटाचे अंगी तैसे । मोजूं जातां अगणित केंश ॥3॥ ऐशा विराटाच्या कोटी । सांटवल्या ज्याच्या पोटीं ॥4॥ तो हा नंदाचा बाळमुकुंद । तान्हा ह्मणवी परमानंद ॥5॥ ऐशी अगम्य इऩश्वरी लीळा । ब्रह्मानंदीं गम्य तुक्याला ॥6॥ 2468 ब्रह्मYाान तरी एके दिवसीं कळे । तात्काळ हा गळे अभिमान ॥1॥ अभिमान लागे शुकाचिये पाठी । व्यासें उपराटी दृष्टी केली ॥ध्रु.॥ जनकभेटीसी पाठविला तेणें । अभिमान नाणें खोटें केलें ॥2॥ खोटें करूनियां लाविला अभ्यासीं । मेरुशिखरासी शुक गेला ॥3॥ जाऊनियां तेणें साधिली समाधी । तुका ह्मणे तधीं होतों आह्मी ॥4॥ 2469 सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं वाठवण कां न धरिती ॥1॥ हरि व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥ विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥2॥ कामक्रोधे देह मिळण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यYा मनमुंडण नव्हे चि ॥3॥ अनन्यभHीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥4॥ आतां सांगे तुका एक तुह्मी चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥5॥ 2470 आह्मीं जाणावें तें काइऩ तुझें वर्म कोणे ठायीं । अंतपार नाहीं ऐसें श्रुति बोलती ॥1॥ होइप मज तैसा मज तैसा साना सकुमार रुषीकेशा । पुरवीं माझी आशा भुजा चारी दाखवीं॥ध्रु.॥ खालता सप्त ही पाताळा वरता स्वर्गाहूनि ढिसाळा । तो मी मस्यक डोळां कैसा पाहों आपला ॥2॥ मज असे हा भरवसा पढीयें वोसी तयां तैसा । पंढरीनिवासा तुका ह्मणे गा विठोबा ॥3॥ 2471 वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥1॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥ आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥2॥ कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवश्वरु॥3॥ हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥4॥ तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥5॥ 2472 अनंत ब्रह्मांडें । एके रोमीं ऐसें धेंडें ॥1॥ तो या गौिळयांचे घरीं । उंबरा चढतां टेंका धरी ॥ध्रु.॥ मारी दैत्य गाडे । ज्यांचे पुराणीं पवाडे ॥2॥ तुका ह्मणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥3॥ 2473 सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥1॥ अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥ मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥2॥ तुका ह्मणे देव अंतरला दुरी । डोिळया अंधारी पडलीसे ॥3॥ 2474 लवण मेळवितां जळें । काय उरलें निराळें ॥1॥ तैसा समरस जालों । तुजमाजी हरपलों ॥ध्रु.॥ अिग्नकर्पुराच्या मेळीं । काय उरली काजळी ॥2॥ तुका ह्मणे होती । तुझी माझी एक ज्योती ॥3॥ 2475 सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥1॥ दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥ चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥2॥ तुका ह्मणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरि ॥3॥ 2476 तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राइऩ रंक राणा ॥1॥ अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ सोळा सहजर नारी ब्रह्मचारी कैसा । निराहारी दुर्वासा नवल नव्हे ॥2॥ पंचभ्रतार द्रौपदी सती । करितां पितृशांती पुण्य धर्मा ॥3॥ दशरथा पातकें ब्रह्महत्ये ऐसीं । नवल त्याचे कुशीं जन्म तुझा ॥4॥ मुनेश्वरा नाहीं दोष अनुमात्र । भांडवितां सुत्र वध होती ॥5॥ तुका ह्मणे माझे दोष ते कायी । सरता तुझा पायीं जालों देवा ॥6॥ पाळणा 2477 जननिया बाळका रे घातलें पाळणा । पंचतkवीं जडियेल्या वारतिया चहूं कोणा । अखंड जडियेल्या तया ढाळ अंगणा । वैखरी धरूनि हातीं भाव दावी खेळणा ॥1॥ निजीं रे निजीं आतां । ह्मणोनि परिये दे माता । खेळतां कष्टलासी बाळा तूं रे नेणतां । निजीं रे निजीं आतां ॥ध्रु.॥ खेळतां बाहेरि रे मुला लोकांच्या सवें । बागुल काळतोंडा नाहीं नेतो तें ठावें । खेळतां दुिश्चत्ता रे देखोनि तें न्यावें । ह्मणोनि सांगें तुज शीघ्र वचन पाळावें॥2॥ संचित मागें तुज शुद्ध होतें सांगाती । तेणें तुज वांचविलें वेरझारिया हातीं । आणीक नेली मागें काय जाणों तीं किती । आलासि येथवरि थोरपुण्यें बहुतीं ॥3॥ खेळतां शुक देवा तो रे लागला पाठीं । लपाला वरुषें बारा तिये मातेचे पोटीं । रिघतां बाहेरि रे पळे घेऊनि कासोटी । ते चि परी जाली स्वामी भेणें रिघें कपाटीं ॥4॥ खेळतां चक्रवर्ती जनका लागला धाक । पडिला अग्नीमाजी पाव जळत एक। भरलासे कांप अंगीं सुख नाठवें दुःख। आप पर तें ही नाहीं देहभाव सकिळक ॥5॥ सिभ्रीया चक्रवर्ती कव पडिली अवचिती । धीट तो न भे तया मास कापिलें हातीं । टाकिलें तयावरी खुणें गोविला अंतीं । पावला मायबाप हिरोन घेतला हातीं ॥6॥ बांधलें अजामेळा वेश्यागणीका कैसी । मारिली हाक धाकें कळलें मायबापासी। घातली धांव नेटें वेगीं पावला त्यासी । हिरोनि नेलीं दोघें आपणयां तीं पासी ॥7॥ धरूनी आठवू रे बाळा राहें निश्चळ । खेळतां दुिश्चता रे नको जाऊं बरळ। टोंकताहे तुजलागीं दिवस लेखूनी काळ । मग नेदी आठवूं रे नेत्रीं घालीं पडळ ॥8॥ ऐसी तीं कृपावंतें बाळा मोहिलें चित्त । सुस्वरें कंठ गाय मधुर आणि संगीत । तेणें तें चि चित्त राहे होऊनियां निवांत । पावती तुका ह्मणे नाहीं विश्वास ते घात ॥9॥ ॥1॥ 2478 उभ्या बाजारांत कथा । हे तों नावडे पंढरिनाथा॥1॥ अवघें पोटासाटीं ढोंग । तेथें कैंचा पांडुरंग ॥ध्रु.॥ लावी अनुसंधान। कांहीं देइऩल ह्मणऊन ॥2॥ काय केलें रांडलेंका । तुला राजी नाहीं तुका ॥3॥ 2479 असोत लोकांचे बोल शिरावरी । माझी मज बरी विठाबाइऩ ॥1॥ आपंगिलें मज आहे ते कृपाळु । बहुत कनवाळु अंतरींची ॥ध्रु.॥ वेदशास्त्रें जिसी वणिऩती पुराणें । तिचें मी पोसणें लडिवाळ ॥2॥ जिचें नाम कामधेनु कल्पतरू । तिचें मी लेंकरूं तुका ह्मणे ॥3॥ 2480 वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥1॥ पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥2॥ तुका ह्मणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥3॥ 2481 सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भिHभावें ॥1॥ पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥ वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥2॥ तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥3॥ 2482 दहएांचिया अंगीं निघे ताक लोणी । एका मोलें दोन्ही मागों नये ॥1॥ आकाशाचे पोटीं चंद्र तारांगणें । दोहींशी समान पाहों नये ॥ध्रु.॥ पृथ्वीचा पोटीं हिरा गारगोटी । दोहोंसी समसाटी करूं नये ॥2॥ तुका ह्मणे तैसे संत आणि जन । दोहींसी समान भजूं नये ॥3॥ 2483 तेरा दिवस जाले निश्चक्र करितां । न पवसी अनंता मायबापा ॥1॥ पाषाणांची खोळ घेउनि बैसलासी । काय हृषीकेशी जालें तुज ॥ध्रु.॥ तुजवरी आतां प्राण मी तजीन । हत्या मी घालीन पांडुरंगा ॥2॥ फार विठाबाइऩ धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे आतां मांडिलें निर्वाण । प्राण हा सांडीन तुजवरी ॥4॥ 2484 लोक फार वाखा अमंगळ जाला । त्याचा त्याग केला पांडुरंगा ॥1॥ विषयां वंचलों मीपणा मुकलों । शरण तुज आलों पांडुरंगा ॥ध्रु.॥ घर दार अवघीं तजिलीं नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा ॥2॥ तुका ह्मणे पडिलों पुंडलिकापाशीं । धांव हृषीकेशी आिंळगीं मज ॥3॥ 2485 इंिद्रयांचीं दिनें । आह्मी केलों नारायणें ॥1॥ ह्मणऊनि ऐसें सोसीं । काय सांगों कोणांपाशी ॥ध्रु.॥ नाहीं अंगीं बळ । त्याग करींसा सकळ ॥2॥ तुका ह्मणे मोटें । प्रारब्ध होतें खोटें ॥3॥ 2486 हातीं धरूं जावें । तेणें परतें चि व्हावें ॥1॥ ऐसा कां हो आला वांटा । हीन भाग्याचा करंटा ॥ध्रु.॥ देव ना संसार । दोहीं ठायीं नाहीं थार ॥2॥ तुका ह्मणे पीक । भूमि न दे न मिळे भीक ॥3॥ 2487 मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ॥1॥ तैसा भिHवाद काय । रंगबेगडीचा न्याय ॥ध्रु.॥ वेठी धरिल्या दावी भाव । मागें पळायाचा पाव ॥2॥ काजव्याच्या ज्योती । तुका ह्मणे न लगे वाती ॥3॥ 2488 तरि च जन्मा यावें । दास विठ्ठलाचें व्हावें ॥1॥ नाहीं तरि काय थोडीं । श्वानशूकरें बापुडीं ॥ध्रु.॥ ज्याल्याचें तें फळ। अंगीं लागों नेदी मळ ॥2॥ तुका ह्मणे भले । ज्याच्या नावें मानवलें ॥3॥ ॥ लळतें 9 ॥ 2489 देव ते संत देव ते संत । निमित्य त्या प्रतिमा ॥1॥ मी तों सांगतसें भावें । असो ठावें सकळां ॥ध्रु.॥ निराकारी ओस दिशा । येथें इच्छा पुरतसे ॥2॥ तुका ह्मणे रोकडें केणें । सेवितां येणें पोट धाय ॥3॥ 2490 न कळे माव मुनि मागे एकी अंतुरी । साठी संवत्सरां जन्म तया उदरीं ॥1॥ कैसा आकळे गे माये चपळ वो । त्रिभुवनव्यापक सकळ वो ॥ध्रु.॥ हनुमंता भेटी गर्व हरिला दोहींचा । गरुडा विटंबना रूपा सत्यभामेच्या ॥2॥ द्रौपदीचा भेद पुरविला समयीं । ॠषि फळवनीं देंठीं लावितां ठायीं ॥3॥ अर्जुनाच्या रथीं कपि स्तंभीं ठेविला । दोहीं पैज तेथें गर्व हरी दादुला ॥4॥ भावभHी सkवगुण जाला दुर्जना । तुका ह्मणे सकळां छंदें खेळे आपण ॥5॥ 2491 उदारा कृपाळा अंगा देवांच्या देवा । तुजसवें पण आतां आमुचा दावा ॥1॥ कैसा जासी सांग आतां मजपासुनी । केलें वाताहात दिले संसारा पाणी ॥ध्रु.॥ अवघीं आवरूनि तुझे लाविलीं पाठीं । आतां त्या विसर सोहंकोहंच्या गोष्टी ॥2॥ तुका ह्मणे आतां चरणीं घातली मिठी । पडिली ते पडो तुह्मा आह्मांसी तुटी ॥3॥ 2492 जाली होती काया । बहु मळीन देवराया ॥1॥ तुमच्या उजळली नामें । चित्त प्रक्षािळलें प्रेमें ॥ध्रु.॥ अनुतापें झाला झाडा । प्रारब्धाचा केला तोडा ॥2॥ तुका ह्मणे देह पायीं । ठेवूनि झालों उतराइऩ ॥3॥ 2493 आजि आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति ह्मणती गोविंदु रे ॥1॥ विठोबाचीं वेडीं आह्मां आनंदु सदा । गाऊं नाचों वाऊं टाळी रंजवूं गोविंदा ॥ध्रु.॥ सदा सन सांत आह्मां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं जन्ममरणांचा धाक । संत सनकादिक तें आमचें कवतुक॥3॥ 2494 प्राणियां एक बीजमंत्र उच्चारीं । प्रतिदिनीं रामकृष्ण ह्मण कां मुरारि ॥1॥ हें चि साधन रे तुज सर्व सिद्धींचे । नाम उच्चारीं पां गोपाळाचें वाचे ॥ध्रु.॥ उपास पारणें न लगे वनसेवन। न लगे धूम्रपान पंचाअग्नतापन ॥2॥ फुकाचें सुखाचें कांहीं न वेचें भांडार । कोटी यYाां परिस तुका ह्मणे हें सार ॥3॥ 2495 विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे ह्मणती॥1॥ तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥ बैसोनि हरिकथेसी । होय सावध चित्तासी ॥2॥ तुका ह्मणे त्याचा जन्म । सुफळ जाला भवक्रम ॥3॥ 2496 न चलवे पंथ वेच नसतां पालवीं । शरीर विटंबिलें वाटे भीक मागावी ॥1॥ न करीं रे तैसें आपआपणां । नित्य राम राम तुह्मी सकळ ह्मणा ॥ध्रु.॥ राम ह्मणवितां रांडा पोरें निरविशी । पडसी यमा हांतीं जाचविती चौ†याशी ॥2॥ मुखीं नाहीं राम तो ही आत्महत्यारा । तुका ह्मणे लाज नाहीं तया गंव्हारा ॥3॥ 2497 थडियेसी निघतां पाषाणांच्या सांगडी । बुडतां मध्यभागीं तेथें कोण घाली उडी ॥1॥ न करी रे तैसें आपआपणा । पतंग जाय वांयां जीवें ज्योती घालूनियां ॥ध्रु.॥ सावधपणें सोमवल [[वाटी]] भरोनियां प्याला । मरणा अंतीं वैद्य बोलावितो गहिला ॥2॥ तुकाह्मणे करीं ठायींचा चि विचार । जंवें नाहीं पातला यमाचा किंकर ॥3॥ ॥9॥ 2498 द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥1॥ किती नेणों तुह्मां साहाते कटकट । आह्मी च वाइऩट निवडलों ते ॥ध्रु.॥ करवितां कल्हें जिवाचियेसाटीं । हे तुह्मां वोखटीं ढाळ देवा ॥2॥ तुका ह्मणे धीर कारण आपुला । तुह्मीं तों विठ्ठला मायातीत ॥3॥ 2499 आमुचे ठाउके तुह्मां गर्भवास । बिळवंत दोष केले भोग ॥1॥ काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥ एका पळवूनि एका पाठी लावा । कवतुक देवा पाहावया ॥2॥ तुका ह्मणे ज्याणें असें चेतविलें । त्याच्यानें उगळें कैसें नव्हे ॥3॥ 2500 निदऩयासी तुह्मी करितां दंडण । तुमचें गा†हाणें कोठें द्यावें ॥1॥ भाकितों करुणा ऐकती कान ।उगलें चि मौन्य धरिलें ऐसें ॥ध्रु.॥ दीनपणें पाहें पाय भिडावोनि । मंजुळा वचनीं विनवीतसें॥2॥ तुका ह्मणे गांठी मनाची उकला । काय जी विठ्ठला पाहातसां ॥3॥ 2501 नसतों किविलवाणें । कांहीं तुमच्या कृपादानें ॥1॥ हे चि तयाची ओळखी । धालें टवटवित मुखीं ॥ध्रु.॥ वांयां जात नाहीं । वचन प्रीतीचें तें कांहीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । सत्य येतें अनुभवा ॥3॥ 2502 जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥1॥ हें कां मिळतें उचित । तुह्मी नेणा कृपावंत ॥ध्रु.॥ सिंहाचें ते पिलें । जाय घेऊनियां कोल्हें ॥2॥ तुका ह्मणे नास । आह्मां ह्मणविलियां दास॥3॥ 2503 देवाच्या उद्देशें जेथें जेथें भाव । तो तो वसे ठाव विश्वंभरें ॥1॥ लोभाचे संकल्प पळालियावरी । कैंची तेथें उरी पापपुण्या ॥ध्रु.॥ शुद्ध भHी मन जालिया निर्मळ । कुश्चळी विटाळ वज्रलेप ॥2॥ तुका ह्मणे ज्याचें तयासी च कळे । प्रांत येतो फळें कळों मग ॥3॥ 2504 कडसणी धरितां अडचणीचा ठाव । ह्मणऊनि जीव त्रासलासे ॥1॥ लौकिकाबाहेरि राहिलों निराळा । तुजविण वेगळा नाहीं तुजा ॥ध्रु.॥ संकोचानें नाहीं होत धणीवरी । उरवूनि उरी काय काज ॥2॥ तुका ह्मणे केलें इच्छे चि सारिखें । नाहींसें पारिखें येथें कोणी ॥3॥ 2505 हें चि जतन करा दान । धरुनी चरण राहिलों तो॥1॥ आणीक कांहीं न घलीं भार । बहुत फार सांकडें ॥ध्रु.॥ घ्यावी माझ्या हातें सेवा । हे चि देवा विनवणी ॥2॥ तुका तुमचा ह्मणवी दास । तेणें आस पुरवावी ॥3॥ 2506 आपल्या च स्काुंफ्दें । जेथें तेथें घेती छंदें ॥1॥ पडिला सत्याचा दुष्काळ । बहु फार जाली घोळ ॥ध्रु.॥ विश्वासाचे माठ । त्याचे कपाळीं तें नाट ॥2॥ तुका ह्मणे घाणा । मूढा तीथाअ प्रदिक्षणा ॥3॥ 2507 उद्वेगाची धांव बैसली आसनीं । पडिलें नारायणीं मोटळें हें ॥1॥ सकळ नििंश्चती जाली हा भरवसा । नाहीं गर्भवासा येणें ऐसा ॥ध्रु.॥ आपुलिया नांवें नाहीं आह्मां जिणें । अभिमान तेणें नेला देवें ॥2॥ तुका ह्मणे चेळें एकाचिया सत्ता । आपुलें मिरवितां पणें ऐसें ॥3॥ 2508 बहुतां पुरे ऐसा वाण । आलें धन घरासी ॥1॥ घ्या रे फुका मोलेंविण । नारायण न भुला ॥ध्रु.॥ ऐका निवळल्या मनें। बरवें कानें सादर ॥2॥ तुका ह्मणे करूनि अंतीं । नििंश्चती हे ठेवावी ॥3॥ 2509 माझी मज जाती आवरली देवा । नव्हतां या गोवा इंिद्रयांचा ॥1॥ कासया मी तुझा ह्मणवितों दास । असतों उदास सर्व भावें ॥ध्रु.॥ भयाचिया भेणें धरियेली कास । न पुरतां आस काय थोरी ॥2॥ तुका ह्मणे आपआपुलीं जतन । कैचें थोरपण मग तुह्मां ॥3॥ 2510 विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥1॥ आमुचे ही कांहीं असों द्या प्रकार । एकल्यानें थोर कैचे तुह्मी ॥ध्रु.॥ नेघावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तें देवा यत्न कीजे ॥2॥ तुका ह्मणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसें ऐसीं दुर्बळें चि ॥3॥ 2511 एका ऐसें एक होतें कोणां काळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥1॥ घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥ केला तो न संडीं आतां कइवाड । वारीन हे आड कामक्रोध ॥2॥ तुका ह्मणे जाळीं अळसाची धाडी । नव्हती आली जोडी कळों साच ॥3॥ 2512 जाले समाधान । तुमचे धरिले चरण ॥1॥ आतां उठावेंसें मना । येत नाहीं नारायणा ॥ध्रु.॥ सुरवाडिकपणें । येथें सांपडलें केणें ॥2॥ तुका ह्मणे भाग । गेला निवारला लाग ॥3॥ 2513 मुखाकडे वास । पाहें करूनियां आस ॥1॥ आतां होइऩल ते शिरीं । मनोगत आYाा धरीं ॥ध्रु.॥ तुह्मीं अंगीकार । केला पाहिजे हें सार ॥2॥ तुका ह्मणे दारीं । उभें याचक मीं हरी ॥3॥ 2514 नाहीं माथां भार । तुह्मी घेत हा विचार ॥1॥ जाणोनियां ऐसें केलें । दुरिल अंगेसी लाविलें ॥ध्रु.॥ आतां बोलावें आवडी । नाम घ्यावें घडी घडी ॥2॥ तुका ह्मणे दुरी । देवा खोटी ऐसी उरी ॥3॥ 2515 माझें जड भारी । आतां अवघें तुह्मांवरी ॥1॥ जालों अंकित अंकिला । तुमच्या मुकलों मागिला ॥ध्रु.॥ करितों जें काम। माझी सेवा तुझें नाम ॥2॥ तुका पायां लागे । कांहीं नेदी ना न मगे॥3॥ 2516 तुह्मी आह्मी भले आतां । जालों चिंता काशाची॥1॥ आपुलाले आलों स्थळीं । मौन कळी वाढेना ॥ध्रु.॥ सहज जें मनीं होतें । तें उचितें घडलें ॥2॥ तुका ह्मणे नसतें अंगा । येत संगा सारिखें ॥3॥ 2517 चित्ता ऐसी नको देऊं आठवण । जेणें देवाचे चरण अंतरे तें ॥1॥ आलिया वचनें रामनामध्वनि । ऐकावीं कानीं ऐसीं गोडें ॥ध्रु.॥ मत्सराचा ठाव शरीरीं नसावा । लाभेंविण जीवा दुःख देतो ॥2॥ तुका ह्मणे राहे अंतर शीतळ । शांतीचें तें बळ क्षमा अंगीं ॥3॥ 2518 कोण पुण्य कोणा गांठी । ज्यासी ऐसियांची भेटी॥1॥ जिहीं हरी धरिला मनीं । दिलें संवसारा पाणी ॥ध्रु.॥ कोण हा भाग्याचा । ऐसियांसी बोले वाचा ॥2॥ तुका ह्मणे त्यांचे भेटी। होय संसारासी तुटी ॥3॥ 2519 तरि च हा जीव संसारीं उदास । धरिला विश्वास तुह्मां सोइऩ ॥1॥ एके जातीविण नाहीं कळवळा । ओढली गोपाळा सूत्रदोरी ॥ध्रु.॥ फुटतसे प्राण क्षणांच्या विसरें । हें तों परस्परें सारिखें चि ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं राखिला अनुभव । तेणें हा संदेह निवारला ॥3॥ 2520 किती विवंचना करीतसें जीवीं । मन धांवडवी दाही दिशा ॥1॥ कोणा एका भावें तुह्मी अंगीकार । करावा विचार या च साटीं ॥ध्रु.॥ इतर ते आतां लाभ तुच्छ जाले । अनुभवा आले गुणागुण ॥2॥ तुका ह्मणे लागो अखंड समाधि । जावें प्रेमबोधीं बुडोनियां ॥3॥ 2521 दिक चि या नाहीं संसारसंबंधा । तुटेना या बाधा भवरोगाची ॥1॥ तांतडींत करीं ह्मणऊनि तांतडी । साधिली ते घडी सोनियाची ॥ध्रु.॥ संकल्पाच्या बीजें इंिद्रयांची चाली । प्रारब्ध तें घाली गर्भवासीं ॥2॥ तुका ह्मणे बीजें जाळुनी सकळ । करावा गोपाळ आपुला तो ॥3॥ 2522 आतां होइन धरणेकरी । भीतरीच कोंडीन ॥1॥ नाही केली जीवेंसाटी । तों कां गोष्टी रुचे तें ॥ध्रु.॥ आधी निर्धार तो सार । मग भार सोसीन ॥2॥ तुका ह्मणे खाऊं जेवूं । नेदूं होऊं वेगळा ॥3॥ 2523 होइल तरि पुसापुसी । उत्तर त्यासी योजावें ॥1॥ तोंवरि मी पुढें कांहीं । आपुलें नाहीं घालीत ॥ध्रु.॥ जाणेनियां अंतर देव । जेव्हां भेव फेडील ॥2॥ तुका ह्मणे धरिला हातीं । करील खंतीवेगळें ॥3॥ 2524 हा तों नव्हे कांहीं निराशेचा ठाव । भलें पोटीं वाव राखिलिया ॥1॥ विश्वंभरें विश्व सामाविलें पोटी । तेथें चि सेवटीं आह्मी असों ॥ध्रु.॥ नेणतां चिंतन करितों अंतरीं । तेथें अभ्यंतरीं उमटेल ॥2॥ तुका ह्मणे माझा स्वामी अबोलणा । पुरवूं खुणे खुणा जाणतसों ॥3॥ 2525 निष्ठ‍ तो दिसे निराकारपणें । कोंवळा सगुणें प्रतिपाळी॥1॥ केला च करावा केला कइवाड । होइऩल तें गोड न परेते ॥ध्रु.॥ मथिलिया लागे नवनीत हातां । नासे वितिळतां आहाच तें ॥2॥ तुका ह्मणे आतां मनाशीं विचार । करावा तो सार एकचित्त ॥3॥ 2526 बहु देवा बरें जालें । नसतें गेलें सोंवळें ॥1॥ धोवटाशीं पडिली गांठी । जगजेठीप्रसादें ॥ध्रु.॥ गादल्याचा जाला जाडा । गेली पीडा विकल्प ॥2॥ तुका ह्मणे वरावरी । निर्मळ करी निर्मळा ॥3॥ 2527 स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥1॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥ धनवंjयाचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥2॥ तुका ह्मणे आलें मोडएासी कोंपट । सांडव्याची वाट विसरावी ॥3॥ 2528 ॠणाच्या परिहारा जालों वोळगणा । द्यावी नारायणा वासलाती ॥1॥ जालों उतराइऩ शरीरसंकल्पें । चुकों द्यावीं पापें सकळ ही ॥ध्रु.॥ आजिवरि होतों धरूनि जिवासी । व्याजें कासाविसी बहु केलें ॥2॥ तुका ह्मणे मना आणिला म्यां भाव । तुमचा तेथें ठाव आहे देवा ॥3॥ 2529 येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥1॥ सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥ बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आह्मां ॥2॥ तुका ह्मणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥3॥ 2530 आपुल्या आपण उगवा लिगाड । काय माझें जड करुन घ्याल ॥1॥ उधारासी काय उधाराचें काम । वाढवूं चि श्रम नये देवा ॥ध्रु.॥ करा आतां मजसाटीं वाड पोट । ठाव नाहीं तंटे जालें लोकीं ॥2॥ तुका ह्मणे बाकी झडलियावरी । न पडें वेव्हारीं संचिताचे ॥3॥ 2531 सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥1॥ दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥ बहु जालों क्षीदक्षीण । येणें सीण तो नासे ॥2॥ तुका ह्मणे गंगवास । बहु त्या आस स्थळाची ॥3॥ 2532 शीतळ तें शीतळाहुनी । पायवणी चरणींचें ॥1॥ सेवन हे शिरसा धरीं । अंतरीं हीं वरदळा ॥ध्रु.॥ अवघें चि नासी पाप । तीर्थ बाप माझ्याचें ॥2॥ बैसोनियां तुका तळीं । त्या कल्लोळीं डौरला ॥3॥ 2533 गोदे कांठीं होता आड । करूनि कोड कवतुकें॥1॥ देखण्यांनीं एक केलें । आइत्या नेलें जिवनापें ॥ध्रु.॥ राखोनियां ठाव । अल्प जीव लावूनि ॥2॥ तुका ह्मणे फिटे धनी । हे सज्जनीं विश्रांति ॥3॥ 2534 न पाहें माघारें आतां परतोनि । संसारापासूनि विटला जीव ॥1॥ सामोरें येऊनि कवळीं दातारा । काळाचा हाकारा न साहावे ॥ध्रु.॥ सावधान चित्त होइऩल आधारें । खेळतां ही बरें वाटइऩल ॥2॥ तुका ह्मणे कंठ दाटला या सोसें । न पवे कैसें जवळी हें ॥3॥ 2535 मथनीचें नवनीत । सर्व हितकारक ॥1॥ दंडवत दंडा परी । मागें उरी नुरावी ॥ध्रु.॥ वचनाचा तो पसरुं काइऩ । तांतडी डोइऩपाशींच ॥2॥ तुका ह्मणे जगजेठी । लावीं कंठीं उचलूनि ॥3॥ 2536 अवचिता चि हातीं ठेवा । दिला सेवा न करितां॥1॥ भाग्य फळलें जाली भेटी । नेघें तुटी यावरी ॥ध्रु.॥ दैन्य गेलें हरली चिंता । सदैव आतां यावरी ॥2॥ तुका ह्मणे वांटा जाला । बोलों बोली देवासीं ॥3॥ 2537 समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥1॥ धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥ न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥2॥ तुका ह्मणे नव्हे धीर । तुह्मां िस्थर दयेनें ॥3॥ 2538 करूं तैसें पाठांतर । करुणाकर भाषण ॥1॥ जिहीं केला मूतिऩमंत । ऐसे संतप्रसाद ॥ध्रु.॥ सोज्ज्वळ केल्या वाटा । आइत्या नीटा मागीलां ॥2॥ तुका ह्मणे घेऊं धांवा । करूं हांवा ते जोडी ॥3॥ 2539 अचळ न चळे ऐसें जालें मन । धरूनि निज खुण राहिलोंसें ॥1॥ आवडी बैसली गुणांची अंतरीं । करूं धणीवरी सेवन तें ॥ध्रु.॥ एकविध भाव नव्हे अभावना । आणिकिया गुणां न मिळवे ॥2॥ तुका ह्मणे माझे पडिलें आहारीं । ध्यान विटेवरी ठाकले तें ॥3॥ 2540 काय तुझी थोरी वणूप मी पामर । होसी दयाकर कृपासिंधु ॥1॥ तुज ऐसी दया नाहीं आणिकासी । ऐसें हृषीकेशी नवल एक ॥ध्रु.॥ कुरुक्षेत्रभूमीवरी पक्षी व्याले । तृणामाजी केलें कोठें त्यांनीं ॥2॥ अकस्मात तेथें रणखांब रोविला । युद्धाचा नेमिला ठाव तेथें ॥3॥ कौरव पांडव दळभार दोन्ही । झुंजावया रणीं आले तेथें ॥4॥ तये काळीं तुज पक्षी आठविती । पाव बा श्रीपती ह्मणोनियां ॥5॥ हस्ती घोडे रथ येथें धांवतील । पाषाण होतील शतचूर्ण ॥6॥ ऐसिये आकांतीं वांचों कैसे परी । धांव बा श्रीहरी लवलाहें ॥7॥ टाकोनियां पिलीं कैसें जावें आतां । पावें जगन्नाथा लवलाहीं ॥8॥ आली तिये काळीं कृपा तुझ्या चित्ता । अनाथांच्या नाथा नारायणा ॥9॥ एका गजाचिया कंठीं घंटा होती। पाडिली अवचिती तयांवरी ॥10॥ अठरा दिवस तेथे द्वंदजुंज जालें । वारा ऊन लागलें नाहीं तयां ॥11॥ जुंज जाल्यावरी दाविलें अर्जुना । तुह्मीं नारायणा पिक्षयांसी ॥12॥ पाहें आपुलिया दासां म्यां रिक्षलें । रणीं वांचविलें कैशा परी ॥13॥ ऐसी तुज माया आपुल्या भHांची । माउली आमुची तुका ह्मणे ॥14॥ 2541 वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥1॥ गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥ लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥2॥ तुका ह्मणे आतां आपुल्या सायासें । आह्मां जगदेशें सांभाळावें ॥3॥ 2542 शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥1॥ स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥ देह सांभाळून। पायांवरी लोटांगण ॥2॥ विनवी संता तुका दीन । नव्हे गोरवें उत्तीर्ण ॥3॥ 2543 लेंकरा लेववी माता अळंकार । नाहीं अंतपार आवडीसी॥1॥ कृपेचें पोसणें तुमचें मी दीन । आजि संतजन मायबाप ॥ध्रु.॥ आरुषा उत्तरीं संतोषे माउली । कवळूनि घाली हृदयात ॥2॥ पोटा आलें त्याचे नेणे गुणदोष । कल्याण चि असे असावें हें ॥3॥ मनाची ते चाली मोहाचिये सोइऩ । ओघें गंगा काइऩ परतों जाणे ॥4॥ तुका ह्मणे कोठें उदार मेघां शिH । माझी तृषा किती चातकाची ॥5॥ 2544 युिH तंव जाल्या कुंटित सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥1॥ संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥ जाणपणें नेणें कांहीं चि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी केलें अभयदान । जेणें समाधान राहिलेंसे ॥3॥ 2545 हा गे आलों कोणी ह्मणे बुडतिया । तेणें किती तया बळ चढे ॥1॥ तुह्मी तंव भार घेतला सकळ । आश्वासिलों बाळ अभयकरें ॥ध्रु.॥ भुकेलियां आस दावितां निर्धार । किती होय धीर समाधान ॥2॥ तुका ह्मणे दिली चिंतामणीसाटीं । उचित कांचवटी दंडवत ॥3॥ 2546 कैसा तीं देखिला होसील गोपाळीं । पुण्यवंतीं डोळीं नारायणा ॥1॥ तेणें लोभें जीव जालासे बराडी । आह्मी ऐशी जोडी कइप लाभों ॥ध्रु.॥ असेल तें कैसें दर्शनाचें सुख । अनुभवें श्रीमुख अनुभवितां ॥2॥ तुका ह्मणे वाटे देसी आलिंगन । अवस्था ते क्षणाक्षणां होते ॥3॥ 2547 कासया या लोभें केलें आर्तभूत । सांगा माझें चित्त नारायणा ॥1॥ चातकाचे परी एक चि निर्धार । लक्षभेदीतीर फिरों नेणे ॥ध्रु.॥ सांवळें रूपडें चतुर्भुज मूतिऩ । कृष्णनाम चित्तीं संकल्प हा ॥2॥ तुका ह्मणे करीं आवडीसी ठाव । नको माझा भाव भंगों देऊं ॥3॥ 2548 काय माझा पण होइऩल लटिका । िब्रदावळी लोकां दाविली ते ॥1॥ खरी करूनियां देइप माझी आळी । येऊनि कृवाळी पांडुरंगे ॥ध्रु.॥ आणीक म्यां कोणा ह्मणवावें हातीं । नये काकुलती दुजियासी ॥2॥ तुका ह्मणे मज येथें चि ओळखी । होइऩन तो सुखी पायांनीं च ॥3॥ 2549 तुह्मां आह्मां जंव जालिया समान । तेथें कोणां कोण सनमानी ॥1॥ उरी तों राहिली गोमटें गौरव । ओढे माझा जीव पायांपाशीं ॥ध्रु.॥ नेणपणें आह्मी आळवूं वोरसें । बोलवितों रसें शब्दरत्नें ॥2॥ तुका ह्मणे लळे पाळीं वो विठ्ठले । कां हे उरविले भेदाभेद ॥3॥ 2550 नको माझे मानूं आहाच ते शब्द । कळवऑयाचा वाद करीतसें ॥1॥ कासयानें बळ करूं पायांपाशीं । भाकावी ते दासीं करुणा आह्मीं ॥ध्रु.॥ काय मज चाड असे या लौकिकें । परी असे निकें अनुभवाचें ॥2॥ लांचावल्यासाटीं वचनाची आळी । टकऑयानें घोळी जवळी मन ॥3॥ वाटतसे आस पुरविसी ऐसें । तरि अंगीं पिसें लावियेले ॥4॥ तुका ह्मणे माझी येथें चि आवडी। श्रीमुखाची जोडी इच्छीतसें ॥5॥ 2551 ह्मणऊनी लवलाहें । पाय आहें चिंतीत ॥1॥ पाठिलागा येतो काळ । तूं कृपाळू माउली ॥ध्रु.॥ बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥2॥ तुका ह्मणे तूं जननी । ये निर्वाणीं विठ्ठलें॥3॥ 2552 जेणें वाढे अपकीतिऩ । सर्वाथाअ तें वर्जावें ॥1॥ सत्य रुचे भलेपण । वचन तें जगासी ॥ध्रु.॥ होइजेतें शूर त्यागें । वाउगें तें सारावें ॥2॥ तुका ह्मणे खोटें वर्म । निंद्यकर्म कािळमा ॥3॥ 2553 याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥1॥ परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥ जालें तरी काय तंट । आतां चट न संटे ॥2॥ तुका ह्मणे चक्रचाळे । वेळ बळें लाविलें॥3॥ 2554 याचा तंव हा चि मोळा । देखिला डोळा उदंड॥1॥ नेदी मग फिरों मागें । अंगा अंगें संचरे ॥ध्रु.॥ कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसां ॥2॥ पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥3॥ अंगीं वसे चि ना लाज । न ह्मणे भाज कोणाची॥4॥ सर्वसाक्षी अबोल्यानें । दुिश्चत कोणें नसावें ॥5॥ तुका ह्मणे धरिला हातीं । मग नििंश्चतीं हरीनें ॥6॥ 2555 प्रसिद्ध हा असे जगा । अवघ्या रंगारंगाचा ॥1॥ तरी वाटा न वजे कोणी । नारायणीं घरबुडी ॥ध्रु.॥ बहुतां ऐसें केलें मागें । लाग लागें लागेना ॥2॥ हो कां नर अथवा नारी । लाहान थोरीं आदर ॥3॥ जालें वेगळें लोकीं पुरे । मग नुरे समूळ ॥4॥ कळेना तो आहे कैसा । कोणी दिशा बहु थोडा ॥5॥ तुका ह्मणे दुस†या भावें । छायें नावें न देखवे ॥6॥ 2556 न संडावा आतां ऐसें वाटे ठाव । भयाशी उपाव रक्षणाचा ॥1॥ ह्मणऊनि मनें विळयेलें मन । कारियेकारण चाड नाहीं ॥ध्रु.॥ नाना वीचि उपाधि करूनियां मूळ । राखतां विटाळ तें चि व्हावें ॥2॥ तुका ह्मणे येथें न वेचे वचन । निजीं निजखूण सांपडली ॥3॥ 2557 सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी॥1॥ वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग जाला ॥ध्रु.॥ कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम जाला ॥2॥ तुका ह्मणे धणी ऐसा जालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥3॥ 2558 देइऩल तें उणें नाहीं । याचे कांहीं पदरीं ॥1॥ पाहिजे तें संचित आतां । येथें सत्ता करावया ॥ध्रु.॥ गुणां ऐसा भरणा भरी। जो जें चारी तें लाभे ॥2॥ तुका ह्मणे देवीं देव । फळे भव आपुला ॥3॥ 2559 तेव्हां होतों भोगाधीन । तुह्मां भिन्न पासूनि ॥1॥ आतां बोलों नये ऐसें । आनारिसें वेगळें ॥ध्रु.॥ सन्मुख जालों स्वामीकडे । भव औठडे निराळे ॥2॥ चिंतिलें तें चिंतामणी । फिटे धणी तों द्यावें ॥3॥ सहज िस्थत आहे अंगीं । प्रसंगीं ते वंचेना॥4॥ तुमची देवा धरिली कास । केला नास प्रपंचा ॥5॥ तुका ह्मणे जाणोनि वर्म । कर्माकर्में ठेविलीं ॥6॥ ॥5॥ 2560 केला कैवाड संतांच्या आधारें । अनुभवें खरें कळों आलें ॥1॥ काय जीवित्वाची धरुनियां आशा । व्हावें गर्भवासा पात्र भेणें ॥ध्रु.॥ अबाळीनें जावें निचिंतिया ठायां । रांडा रोटा वांयां करूं नये ॥2॥ तुका ह्मणे बळी देतां तें निधान । भिकेसाटीं कोण राज्य देतो ॥3॥ 2561 संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥1॥ जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोइऩ । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥ उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे तरीं सज्जनाची कीतिऩ । पुरवावी आतिऩ निर्बळांची ॥3॥ 2562 करितां विचार सांपडलें वर्म । समूळ निश्रम परिहाराचें॥1॥ मज घेऊनियां आपणांसी द्यावें । साटी जीवें जीवें नारायणा ॥ध्रु.॥ उरी नाहीं मग पडदा कां आला । स्वमुखें चि भला करितां वाद ॥2॥ तुका ह्मणे माझें खरें देणें घेणें । तुह्मी साक्षी जाणें अंतरींचें ॥3॥ 2563 कुळींची हे कुळदेवी । केली ठावी संतांनीं ॥1॥ बरवें जालें शरण गेलों । उगविलों संकटीं ॥ध्रु.॥ आणिला रूपा ही बळें । करूनि खळें हरिदासीं ॥2॥ तुका ह्मणे समागमें । नाचों प्रेमें लागलों ॥3॥ 2564 आतां देह अवसान । हें जतन तोंवरी ॥1॥ गाऊं नाचों गदारोळें । जिंकों बळें संसार ॥ध्रु.॥ या चि जीऊं अभिमानें। सेवाधनें बळकट ॥2॥ तुका ह्मणे न सरें मागें । होइऩन लागें आगळा ॥3॥ 2565 ज्याने आड यावें कांहीं । त्याचें नाहीं बळ आतां॥1॥ मन येथें साहए जालें । हरिच्या धालें गुणवादीं ॥ध्रु.॥ चुकुर तो गेला काळ । जालें बळ संगाचें ॥2॥ तुका ह्मणे धरूं सत्ता । होइऩल आतां करूं तें ॥3॥ 2566 देवासी तो पुरे एकभाव गांठी । तो चि त्याचे मिठी देइल पायीं ॥1॥ पाहोनि राहीन कवतुक निराळा । मी मज वेगळा होऊनियां ॥ध्रु.॥ कांहीं नेघें शिरीं निमिkयाचा भार । न लगे उत्तर वेचावें चि ॥2॥ तुका ह्मणे जीवें पडिलिया गांठी । मग नाहीं मिठी सुटों येत ॥3॥ 2567 लौकिकासाटीं या पसा†याचा गोवा । कांहीं नाहीं देवा लागों येत ॥1॥ ठेवावा माथा तो नुचलावा पायीं । ठांयींचिये ठांयीं हालों नये ॥ध्रु.॥ डव्हिळल्या मनें वितिळलें रूप । नांवऐसें पाप उपाधीचें ॥2॥ तुका ह्मणे देव प्रीतीनें कवळी । ठेवील जवळी उठवूनि ॥3॥ 2568 नाहीं होत भार घातल्या उदास । पुरवावी आस सकळ ही ॥1॥ ऐसा नाहीं मज एकाचा अनुभव । धरिला तो भाव उद्धरलें ॥ध्रु.॥ उतावीळ असे शरणागतकाजें । धांव केशीराजे आइकतां ॥2॥ तुका ह्मणे हित चिंतन भरवंसा । नेदी गर्भवासा येऊं देवा ॥3॥ 2569 उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥1॥ उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आह्मी जालों निंद लंडीपणें ॥ध्रु.॥ उभयतां आहे करणें समान । तुह्मां ऐसा ह्मणें मी ही देवा ॥2॥ तुका ह्मणे हातीं सांपडलें वर्म । अवघाची भ्रम फेडिन आतां ॥3॥ 2570 मेलियांच्या रांडा इिच्छती लेकरूं । लाज नाहीं धरूं प्रीती कैशी ॥1॥ मागिलां पुढिलां एकी सरोबरी । काळाची पेटारी खांदा वाहे ॥ध्रु.॥ आन दिसे परी मरणें चि खरें । सांपळा उंदिरें सामाविलीं ॥2॥ तुका ह्मणे जाली मनाची परती । निवळली ज्योती दिसों आली ॥3॥ 2571 निष्ठ‍ मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥1॥ सांडियेली तुह्मी गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥ सांपडूनि संदी केली जीवेंसाटीं । घ्यावयासि तुटी कारण हें ॥2॥ तुका ह्मणे तुज काय ह्मणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥3॥ 2572 माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥1॥ काशासाटीं विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥ जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥2॥ तुका ह्मणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥3॥ 2573 समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची॥1॥ दुस†याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥ खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुह्मांसी तें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां सवें करितां वाद । होइऩजेतें निंद जनीं देवा ॥3॥ 2574 तुह्मां आह्मांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥1॥ किती ह्मणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥ बोलिल्याची आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥2॥ तुका ह्मणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥3॥ 2575 सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥1॥ परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥ अंगें सवाौत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥2॥ तुका ह्मणे दाता । तरि हा जीव दान देता॥3॥ 2576 कोणापाशीं द्यावें माप । आपीं आप राहिलें ॥1॥ कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥ एकें दाखविले दाहा। फांटा पाहा पुसून ॥2॥ तुका ह्मणे सरलें वोझें । आतां माझें सकळ॥3॥ 2577 नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥1॥ आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु.॥ कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपण्यां ॥2॥ तुका ह्मणे कल्प जाला। अस्त गेला उदय ॥3॥ 2578 राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥1॥ कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥ वाइले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभरें । करुणाकरें रिक्षलें ॥3॥ 2579 आह्मी देव तुह्मी देव । मध्यें भेव अधीक ॥1॥ कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥ भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥2॥ तुका ह्मणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥3॥ 2580 हीनसुरबुद्धीपासाीं । आकृतीसी भेद नाहीं ॥1॥ एक दांडी एक खांदी । पदीं पदीं भोगणें ॥ध्रु.॥ एकाऐसें एक नाहीं । भिन्न पाहीं प्रकृती ॥2॥ तुका ह्मणे भूमी खंडे । पीक दंडे जेथें तें॥3॥ 2581 काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥1॥ कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥ वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥2॥ भिHभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा॥3॥ कोरडएा उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥4॥ करी विYाापना । तुका प्रसादाची दाना ॥5॥ 2582 आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुिद्ध तेणें न्यायें ॥1॥ ह्मणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥ विषासाटीं सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥2॥ तुका ह्मणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥3॥ 2583 क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥1॥ येइप वो येइप वो येइप लवलाहीं । आिंळगूनि बाहीं क्षेम देइप ॥ध्रु.॥ उताविळ मन पंथ अवलोकी । आठवा ते चुकी काय जाली ॥2॥ तुका ह्मणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥3॥ 2584 आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुह्मी ॥1॥ निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुह्मांआह्मांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥ आणीक तों आह्मी न देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥3॥ 2585 तांतडीनें आह्मां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥1॥ नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥ वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं सदा ॥2॥ तुका ह्मणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥3॥ 2586 नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥1॥ न संगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥ सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥2॥ तुका ह्मणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें॥3॥ 2587 वचनें चि व्हावें आपण उदार । होइल विश्वंभर संपुष्ट चि ॥1॥ सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥ वंचिलिया काया येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥2॥ तुका ह्मणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥3॥ 2588 उखतें आयुष्य जायांचें किळवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥1॥ कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥ उत्पित्त प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥2॥ तुका ह्मणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥3॥ 2589 बोलावे ह्मुण हे बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥1॥ भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥ मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांडे असुकानें ॥2॥ तुका ह्मणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥3॥ 2590 लटिक्याचे वाणी चवी ना संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥1॥ अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥ अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥2॥ तुका ह्मणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥3॥ 2591 नये स्तवूं काचें होतें क्रियानष्ट । काुंफ्दाचे ते कष्ट भंगा मूळ ॥1॥ नाहीं परमार्थ साधत लौकिकें । धरुन होतों फिकें अंगा आलें ॥ध्रु.॥ पारखिया पुढें नये घालूं तोंड । तुटी लाभा खंड होतो माना ॥2॥ तुका ह्मणे तरी मिरवतें परवडी । कामावल्या गोडी अविनाश ॥3॥ 2592 कोण्या काळें येइऩल मना । नारायणा तुमचिया॥1॥ माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥ लागली हे तळमळ चित्ता । तरी दुिश्चता संसारी ॥2॥ सुखाची च पाहें वास । मागें दोष सांभाळीं ॥3॥ इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥4॥ लाहो काया मनें वाचा । देवा साच्या भेटीचा ॥5॥ कांटाळा तो न धरावा । तुह्मी देवा दासांचा ॥6॥ तुका ह्मणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥7॥ 2593 घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥1॥ ऐसीं कैंचीं आह्मी पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥ व्हावें तरीं व्हावें बहुत चि दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥2॥ तुका ह्मणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥3॥ 2594 काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥1॥ पडिलें हें दिसे ब्रह्मांड चि वोस । दाटोनि उच्छ्वास राहातसे ॥2॥ तुका ह्मणे आगा सर्वजाणतिया । विश्वंभरें काया निववावी ॥3॥ 2595 सुकलियां कोमां अत्यंत जळधर । तेणें च प्रकार न्याय असे ॥1॥ न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मन त्वरेलागीं ॥2॥ तुका ह्मणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥3॥ 2596 शृंगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥1॥ न घलावा मधीं कामाचा विलंब । तुह्मी तों स्वयंभ करुणामूतिऩ ॥2॥ तुका ह्मणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥3॥ 2597 तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥1॥ तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥2॥ तुका ह्मणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥3॥ 2598 कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥1॥ बिळयाचीं आह्मी बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥ आतां कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥2॥ तुका ह्मणे पंढरीराया । थापटितों ठोक बाहएा ॥3॥ 2599 डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपें संकल्प ॥1॥ अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥ वाचा केली माप । रासीं हरिनाम अमुप ॥2॥ भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥3॥ 2600 आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥1॥ देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥ नेणे भाग सीण । दुजें कोणी तुह्मांविण ॥2॥ आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी॥3॥ 2601 संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥1॥ अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥ उभय लोकीं उत्तम कीतिऩ । देव चित्तीं राहिलिया ॥2॥ तुका ह्मणे जीव धाय । नये हाय जवळी ॥3॥ 2602 भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥1॥ धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥ जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांटवणें ॥2॥ तुका ह्मणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी॥3॥ 2603 जरी आलें राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥1॥ तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥ वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥2॥ तुका ह्मणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥3॥ 2604 कोण होइऩल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥1॥ केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥ सहजें चि घडे आतां मोऑयाविण । येथें काय सीण आणि लाभ ॥2॥ तुका ह्मणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥3॥ 2605 आह्मां शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥1॥ परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥ अभयदानवृंदें। आह्मां कैंचीं द्वंदें ॥2॥ तुका ह्मणे आह्मी । हरिजन साधनाचे स्वामी॥3॥ 2606 देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥1॥ नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥2॥ तुका ह्मणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥3॥ ॥1॥ 2607 खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥1॥ करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥ दया संतां भांडवल। वेची बोल उपकार ॥2॥ तुका ह्मणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥3॥ 2608 जग ऐसें बहुनांवें । बहुनावें भावना ॥1॥ पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥ कारियासी जें कारण। तें जतन करावें ॥2॥ तुका ह्मणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥3॥ 2609 निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥1॥ पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥ धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥2॥ अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥3॥ 2610 आतां दुसरें नाहीं वनीं । निरांजनी पडिलों ॥1॥ तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥ मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥2॥ तुका ह्मणे करुणाकरा । तूं सोयरा जीवींचा ॥3॥ 2611 धरूनियां सोइऩ परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां॥1॥ येइप पांडुरंगे नेइप सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों॥ध्रु.॥ बुिद्ध जाली साहए परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥2॥ न चलती पाय गिळत जाली काया । ह्मणऊनि दया येऊं द्यावी ॥3॥ दिशच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वास पाहें ॥4॥ तुका ह्मणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥5॥ 2612 कौलें भरियेली पेंठ । निग्रहाचे खोटे तंट ॥1॥ ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥ कामवितां लोहो कसे। तांतडीनें काम नासे ॥2॥ तुका ह्मणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥3॥ 2613 चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥1॥ बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥ नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥2॥ तुका ह्मणे भिH । सुखरूप आदीं अंतीं ॥3॥ 2614 करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रह्मांदिकां पार नुलंघवे सामथ्यॉ ॥1॥ शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना। आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥ पाठीवरी मोळी तो चि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥2॥ आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका ह्मणे ओढी पायां सोइऩ मनाची ॥3॥ 2615 बहुतां जातीचा केला अंगीकार । बहुत ही फार सवाौत्तमें ॥1॥ सरला चि नाहीं कोणांचिये वेचें । अक्षोभ ठायींचें ठायीं आहे ॥ध्रु.॥ लागत चि नाहीं घेतां अंतपार । वसवी अंतर अणुचें ही ॥2॥ तुका ह्मणे केला होय टाकीऐसा । पुरवावी इच्छा धरिली ते ॥3॥ 2616 पोट धालें आतां जीवनीं आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥1॥ काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवावीं ॥ध्रु.॥ वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभािळतां ठाव काय वांचे ॥2॥ दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुिश्चत एकपणें ॥3॥ नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥4॥ तुका ह्मणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रह्मानंद एकसरें॥5॥ 2617 एका हातीं टाळ एका हातीं चिपिळया । घालिती हुंमरी एक वाताती टािळया ॥1॥ मातले वैष्णव नटती नाना छंदें। नाहीं चाड मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥ हाका अरोिळया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न कळे केव्हां रजनी दिवस ॥2॥ तीथाअ नाहीं चाड न लगे जावें वनांतरा । तुका ह्मणे हरिहरात्मक चि पृथुवी॥3॥ 2618 देव सखा आतां केलें नव्हे काइऩ । येणें सकळइऩ सोइरीं च ॥1॥ भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥ पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥2॥ अविनाश जोडी आह्मां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥3॥ पायांवरी डोइऩ ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥4॥ तुका ह्मणे जीव पावला विसावा । ह्मणवितां देवा तुमचींसीं ॥5॥ 2619 कोण आतां किळकाळा । येऊं बळा देइऩल ॥1॥ सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥ लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥2॥ तुका ह्मणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥3॥ 2620 आह्मां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥1॥ उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥ आह्मी शोभों निकटवासें। अनारिसें न दिसे ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं॥3॥ 2621 देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥1॥ अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥ क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें राहे ॥2॥ तुका ह्मणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥3॥ 2622 आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥1॥ केलें तरीं आतां शुशोभें करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥ नाहीं भHराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥2॥ तुका ह्मणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥3॥ 2623 काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारासी ॥1॥ काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥ केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें । नेमलें तें भावें पालटेना ॥12॥ तुका ह्मणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥3॥ 2624 पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥1॥ केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥ आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥2॥ तुका ह्मणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुह्मी ॥3॥ 2625 बहुत करूनि चाळवाचाळवी । किती तुह्मी गोवी करीतसां ॥1॥ लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥ दुजियाचा तंव तुह्मांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥2॥ तुका ह्मणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥3॥ 2626 तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥1॥ वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥ अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥2॥ तुका ह्मणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुिद्ध कष्टी सदा दुःखी ॥3॥ 2627 नव्हे मतोऑयाचा वाण । नीच नवा नारायण ॥1॥ सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥ लाभ हातोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥2॥ तुका ह्मणे नेणों किती । पुरोनि उरलें पुढती ॥3॥ 2628 घातला दुकान । देती आलियासी दान ॥1॥ संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥ मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥2॥ तुका ह्मणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥3॥ 2629 नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥1॥ ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ध्रु.॥ पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥2॥ भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥3॥ देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥4॥ तुका ह्मणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥5॥ 2630 लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥1॥ ह्मणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥ एकविध आह्मी स्वामिसेवेसाटीं । वरी तो चि पोटीं एकभाव ॥2॥ तुका ह्मणे करीं सांगितलें काम । तुह्मां धर्माधर्म ठावे देवा ॥3॥ 2631 ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥1॥ आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजा याचा ॥ध्रु.॥ प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अवचित ॥2॥ तुका ह्मणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥3॥ 2632 आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥1॥ भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥ पाकसििद्ध स्वहस्तकें विनियोग। आवडीचे भाग सिद्ध केले ॥2॥ तुका ह्मणे आला उिच्छष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥3॥ 2633 समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥1॥ पावलें घेइऩन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं दाऊं॥ध्रु.॥ न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥2॥ तुका ह्मणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥3॥ 2634 आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा॥1॥ अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥ नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥2॥ तुका ह्मणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥3॥ 2635 जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥1॥ होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥ लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । त्यांचें यां पुरतें विभागिलें ॥2॥ तुका ह्मणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंगा ॥3॥ 2636 उदार तूं हरी ऐसी कीतिऩ चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥1॥ तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव। देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रह्मांडा ॥ध्रु.॥ मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥2॥ दिसों देसी कीविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका ह्मणे जिणें माझें तुज अधीन ॥3॥ 2637 पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥1॥ मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥ नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न ह्मणे दगड ॥2॥ तुका ह्मणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा घडल्या दोषांच्या ॥3॥ 2638 आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥1॥ लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥ होतें गोविलें विसारें माप जालें एकसरें । होतें होरें वारें तों चि लाहो साधिला॥2॥ कराया जतन तुका ह्मणे निजधन । केला नारायण साहए नेदी विसंबों ॥3॥ 2639 तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एका रूपें भिन्नत्व ॥1॥ सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥ वसो डोऑयांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥2॥ जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पडिला नांवें तुका ह्मणे खंडलें ॥3॥ 2640 सोसें सोसें मारूं हाका । होइल चुका ह्मणऊनि॥1॥ मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥ नाम मुखीं बैसला चाळा। वेळोवेळां पडताळीं ॥2॥ तुका ह्मणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥3॥ 2641 धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥1॥ पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥ नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाइऩन ॥2॥ तुका ह्मणे संतमेळीं । पायधुळी वंदीन॥3॥ 2642 मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥1॥ भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥ध्रु.॥ उत्तम तें बाळासाटीं । लावी ओठीं माउली ॥2॥ तुका ह्मणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥3॥ 2643 उदासीनाचा देह ब्रह्मरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥1॥ अनुताप अंगीं अिग्नचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥ दोष ऐशा नावें देहाचा आदर । विटलें अंतर अहंभावें॥2॥ तुका ह्मणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥3॥ 2644 बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥1॥ नाहीं तें च घेतां शिरीं । होइल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥ नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥2॥ तुका ह्मणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥3॥ 2645 तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥1॥ आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥ आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥2॥ तुका ह्मणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥3॥ 2646 उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥1॥ पुरवीं वासना साच सर्वजाणा । आह्मां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥ बहुदिसां पुत्रामातेमध्यें भेटीं । तैसा दाटो पोटीं प्रीतिउभोड ॥2॥ तुका ह्मणे धन कृपणा सोयरें । यापरि दुसरें नहो आतां ॥3॥ 2647 रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥1॥ संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥ वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हा चि बडिवार मिरवितों ॥2॥ तुका ह्मणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुह्मी जाणां ॥3॥ 2648 सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥1॥ ह्मणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥ सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥2॥ तुका ह्मणे सुरा । दुधा ह्मणतां केवीं बरा॥3॥ 2649 धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥1॥ भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥ याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥2॥ तुका ह्मणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥3॥ 2650 द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥1॥ अंती बोळवणेसाटीं । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥ लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥2॥ तुका ह्मणे हितें । जग नव्हो पडो रितें॥3॥ 2651 कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥1॥ कोणां आराणूक होइऩल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥ माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥2॥ भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥3॥ तुका ह्मणे देतों देवाचें गा†हाणें । माझें रिण येणें सोसियेलें ॥4॥ 2652 राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥1॥ करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥ भुललिया संसारें । आलें डोऑयासी माजिरें ॥2॥ तुका ह्मणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥3॥ 2653 आह्मां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणसकळ स्वामीचे ते ॥1॥ चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आYाा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥ दुजियापासून परतलें मन । केलें द्यावें दान होइऩल तें॥2॥ तुका ह्मणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही॥3॥ 2654 राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥1॥ ऐसा धीर देइप मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥ अंतरीं तों तुझा वास । आणिकां नास कारण ॥2॥ तुका ह्मणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥3॥ 2655 चंदन तो चंदनपणें । सहज गुणसंपन्न ॥1॥ वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥ परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥2॥ तुका ह्मणे कैंची खंती । सुजाती ते ठाकणी ॥3॥ 2656 लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥1॥ हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवितां ॥ध्रु.॥ कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥2॥ कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुिद्ध ॥3॥ भिH तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥4॥ तुका ह्मणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥5॥ 2657 ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥1॥ विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥ श्रुतीचें कां नेघा फळ। सारमूळ जाणोनि ॥2॥ तुका ह्मणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी॥3॥ 2658 जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥1॥ रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । ह्मणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥ वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । Yाानािग्न भरभरां जीवित्वेसी ॥2॥ फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥3॥ दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समपिऩलें ॥4॥ तुका ह्मणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥5॥ 2659 आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥1॥ आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥ एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥2॥ फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥3॥ नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥4॥ तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥5॥ 2660 बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीसीं ॥1॥ एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥ अमृतसंजीवनी निवविली खाइऩ । अंगें तये ठायीं हारपलीं ॥2॥ एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ।3॥ अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥4॥ तुका ह्मणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥5॥ 2661 पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं॥1॥ सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मार्पण सेवटींच्या ॥ध्रु.॥ सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥2॥ पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनादऩन अभेदेंसी ॥3॥ आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥4॥ तुका ह्मणे केला अवघियांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥5॥ 2662 सरलें आतां नाहीं । न ह्मणे वेळकाळ कांहीं ॥1॥ विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥ सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठ‍ नाहीं राग ॥2॥ भेदाभेद नाहीं । तुका ह्मणे तिच्याठायीं ॥3॥ 2663 तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा नाहीं ठाव ॥1॥ करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥ बाहिरल्या वेषें उत्तम दंडलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें॥2॥ तुका ह्मणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुह्मी साहे न व्हा देवा ॥3॥ 2664 दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥1॥ आतां तुह्मी सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें॥ध्रु.॥ व्याहएाजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिजे तो काळ नव्हे कांहीं ॥2॥ तुका ह्मणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुह्मां हातीं ॥3॥ 2665 आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥1॥ आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥ येथें नाहीं जाली कोणांची निरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥2॥ तुका ह्मणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥3॥ 2666 वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं ॥1॥ आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥ ज्याचे घरीं खावें ।त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥2॥ तुका ह्मणे माग । नाहीं लागों देत लाग॥3॥ 2667 ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥1॥ नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥ हे चि यांची जोडी। सदा बोडकीं उघडीं ॥2॥ तुका ह्मणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥3॥ 2668 आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥1॥ ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥ आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥2॥ आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥3॥ आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा नाहीं दोन्ही ॥4॥ तुका ह्मणे करी आपण्यासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥5॥ 2669 दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥1॥ त्याची बुिद्ध त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥ पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥2॥ उंच निंच नाहीं । तुका ह्मणे खळा कांहीं ॥3॥ 2670 न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥1॥ ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विYाापना ॥ध्रु.॥ मायबाप बंधुजन। तूं चि सोयरा सज्जन ॥2॥ तुका ह्मणे तुजविरहित । माझें कोण करी हित ॥3॥ 2671 जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥1॥ ते मी नाठवीं घडिघडी । ह्मणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥ तुटे भवरोग । जेथें सर्व सुखें भोग ॥2॥ तुका ह्मणे विटे । धरियेले जें गोमटें ॥3॥ 2672 ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुह्मां ॥1॥ तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥ आमुच्या जीवींचा तो चि जाणे भावो । रकुमाइऩचा नाहो पांडुरंग ॥2॥ चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । ह्मणऊनि कांहीं नावडे त्या ॥3॥ तुका ह्मणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥4॥ 2673 ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥1॥ निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥ काय पळे सुखें चोरा लागे पाठी । न घलावी काठी आड तया ॥2॥ जयाचें कारण तो चि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥3॥ तुका ह्मणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥4॥ 2674 काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥1॥ माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोण सांगा ॥ध्रु.॥ धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुह्मी ॥2॥ वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुह्मां एक सांगतों मी ॥3॥ तुका ह्मणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुH जाला मान पावे ॥4॥ 2675 नव्हती माझे बोल जाणां हा निर्धार । मी आहें मजूर विठोबाचा ॥1॥ निर्धारा वचन सोडविलें माझ्या । कृपाळुवें लज्जा राखियेली ॥ध्रु.॥ निर्भर मानसीं जालों आनंदाचा । गोडावली वाचा नामघोषें ॥2॥ आतां भय माझें नासलें संसारीं । जालोंसें यावरी गगनाचा ॥3॥ तुका ह्मणे हा तों संतांचा प्रसाद । लाधलों आनंद प्रेमसुख ॥4॥ 2676 जरा कर्णमूळीं सांगों आली गोष्टी । मृत्याचिये भेटी जवळी आली ॥1॥ आतां माझ्या मना होइप सावधान । वोंपुण्याची जाण कार्यसिद्धी ॥ध्रु.॥ शेवटील घडी बुडतां न लगे वेळ । साधावा तो काळ जवळी आला ॥2॥ तुका ह्मणे चिंतीं कुळींची देवता । वारावा भोंवता शब्द मिथ्या ॥3॥ 2677 मागील ते आटी येणें घडे सांग । सुतवेल अंग एका सूत्रें ॥1॥ पहिपाहुणेर ते सोहऑयापुरते । तेथुनि आरते उपचार ते॥ध्रु.॥ आवश्यक तेथें आगळा आदर । चाली थोडें फार संपादतें ॥2॥ तुका ह्मणे ॠण फिटे एके घडी । अलभ्य ते जोडी हातां आल्या ॥3॥ 2678 साधावा तो देव सर्वस्वाचेसाटीं । प्रारब्ध तुटी क्रियमाण॥1॥ मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥ जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥2॥ तुका ह्मणे निज भोगइऩल निजता । नाहीं होइल सत्ता दुजियाची ॥3॥ 2679 जळों अगी पडो खान । नारायण भोHा ॥1॥ ऐसी ज्याची वदे वाणी । नारायणीं ते पावे ॥ध्रु.॥ भोजनकाळीं करितां धंदा । ह्मणा गोविंदा पावलें ॥2॥ तुका ह्मणे न लगे मोल। देवा बोल आवडती ॥3॥ 2680 संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥1॥ देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥ संतांपाशीं ज्याचा नुरे चि विश्वास । त्याचे जाले दोष बिळवंत ॥2॥ तुका ह्मणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं ॥3॥ 2681 उदकीं कालवी शेण मलमूत्र । तो होय पवित्र कासयानें ॥1॥ उद्धारासी ठाव नाहीं भाग्यहीना । विन्मुख चरणां संतांचिया ॥ध्रु.॥ दुखवी तो बुडे सांगडीचा तापा । अतित्याइऩ पापाची च मूतिऩ ॥2॥ तुका ह्मणे जेव्हां फिरतें कपाळ । तरी अमंगळ योग होतो ॥3॥ 2682 शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥1॥ तरी च नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥ जावें वनांतरा। येणें उद्देशें दातारा ॥2॥ तुका ह्मणे गिरी । मज सेववावी दरी ॥3॥ 2683 येइल तुझ्या नामा । जाल ह्मणों पुरुषोत्तमा ॥1॥ धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥ जगा कथा नांव। निराशेनें नुपजे भाव ॥2॥ तुह्मी साक्षी कीं गा । तुका ह्मणे पांडुरंगा ॥3॥ 2684 नेणें जप तप अनुष्ठान याग । काळें तंव लाग घेतलासे ॥1॥ रिघालो या भेणें देवाचे पाठीसी । लागे त्याचें त्यासी सांभाळणें ॥ध्रु.॥ मापें माप सळे चालिली चढती । जाली मग राती काय चाले ॥2॥ तुका ह्मणे चोरा हातीं जे वांचलें । लाभावरी आलें वारिलेशु ॥3॥ 2685 कळों आलें ऐसें आतां । नाहीं सत्ता तुह्मांसी ॥1॥ तरी वीर्य नाहीं नामा । जातो प्रेमा खंडत ॥ध्रु. ॥ आड ऐसें येतें पाप। वाढे ताप आगळा ॥2॥ तुका ह्मणे गुण जाला । हा विठ्ठला हीनशिH ॥3॥ 2686 लागों दिलें अंगा । ऐसें कां गा सन्निध ॥1॥ कोण्या पापें उदो केला । तो देखिला प्रळय ॥ध्रु.॥ न देखवे पिडला सर्प। दया दर्प विषाचा ॥2॥ तुका ह्मणे भलें । मज तो न वजे साहिलें॥3॥ 2687 धांवा शीघ्रवत । किंवा घ्यावें दंडवत ॥1॥ तुमचा जातो बडिवार । आह्मीं होतों हीनवर ॥ध्रु.॥ न धरावा धीर । धांवा नका चालों िस्थर ॥2॥ तुका ह्मणे वाणी । माझी लाजली जी गुणीं ॥3॥ 2688 सेवकासी आYाा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥1॥ मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आक्रशावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥ भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥4॥ तुका ह्मणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद कशाला ॥3॥ 2689. उद्वेगासी बहु फाकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥1॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु ॥ मज तो अत्यंत दर्शनाची आस । जाला तरि हो नाश जीवित्वाचा ॥2॥ तुका ह्मणे आहे वचनाची उरी । करितों तोंवरि विYाापना ॥3॥ 2690 दुःखाची संगति । तिच्याठायीं कोण प्रीति ॥1॥ अवघें असो हें निराळें । करूं सोइरें सावळें ॥ध्रु.॥ क्षणभंगुर ते ठाव। करूनि सांडावे चि वाव ॥2॥ तुका ह्मणे बरा । ठाव पावलों हा थारा ॥3॥ 2691 मेला तरी जावो सुखें नरकासी । कळंकी याविशीं शिवों नये ॥1॥ रजस्वला करी वेलासी आघात । अंतरें तों हित दुरी बरें ॥ध्रु.॥ उगी च कां आलीं नासवावीं फळें । विटाळ विटाळें कालवूनि ॥2॥ तुका ह्मणे [[लोणी]] घालोनि शेणांत । उपेगाची मात काय असे ॥3॥ 2692 वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥1॥ विश्वासिया घडे लाभ । देइल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥ भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥2॥ तुका ह्मणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥3॥ 2693 संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥1॥ कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥ धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥2॥ तुका ह्मणे आड । स्वहितासी बहु नाड ॥3॥ 2694 अतित्याइऩ बुडे गंगे । पाप लागे त्याचें त्या ॥1॥ हें तों आपुलिया गुणें । असे जेणें योजिलें ॥ध्रु.॥ अवचटें अिग्न जाळी । न सांभाळी दुःख पावे ॥2॥ जैसें तैंसें दावी आरसा । नकटएा कैसा पालटे ॥3॥ 2695 हेंद†याचें भरितां कान । हलवी मान भोंक रितें ॥1॥ नाहीं मी येथें सांगों स्पष्ट । भावें नष्ट घेत नाहीं ॥ध्रु.॥ अवगुणी वाटलें चित्त । तया हित आतळे ना ॥2॥ तुका ह्मणे फजितखोरा। ह्मणतां बरा उगा रहा ॥3॥ 2696 नाहीं सरो येत जोडिल्या वचनीं । कवित्वाची वाणी कुशळता ॥1॥ सत्याचा अनुभव वेधी सत्यपणें । अनुभवाच्या गुणें रुचों येतों ॥ध्रु.॥ काय आगीपाशीं शृंगारिलें चाले । पोटींचें उकले कसापाशीं ॥2॥ तुका ह्मणे येथे करावा उकल । लागे चि ना बोल वाढवूनि ॥3॥ 2697 लचाळाच्या कामा नाहीं ताळावाळा । न कळे ओंगळा उपदेश ॥1॥ वचनचर्येची न कळे चांचणी । ऐसी संघष्टनी अमंगळ ॥ध्रु.॥ समय न कळे वेडगळ बुिद्ध । विजाती ते शुिद्ध चांच चाट ॥2॥ तुका ह्मणे याचा धिक्कार चि बरा । बहुमति खराहूनि हीन ॥3॥ 2698 एक धरिला चित्तीं । आह्मीं रखुमाइऩचा पती ॥1॥ तेणें जालें अवघें काम । निवारला भवश्रम ॥ध्रु.॥ परद्रव्य परनारी । जालीं विषाचिये परी ॥2॥ तुका ह्मणे फार । नाहीं लागत वेव्हार ॥3॥ 2699 भेणें पळे डोळसा । न कळे मृत्यु तो सरिसा ॥1॥ कैसी जाली दिशाभुली । न वजातिये वाटे चाली ॥ध्रु.॥ संसाराची खंती । मावळल्या तरी शिH ॥2॥ तुका ह्मणे हीणा । बुिद्ध चुकली नारायणा ॥3॥ 2700 अभिमानाचें तोंड काळें । दावी बळें अंधार ॥1॥ लाभ न्यावा हातोहातीं । तोंडी माती पाडोनि ॥ध्रु.॥ लागलीसे पाठी लाज । जालें काज नासाया ॥2॥ तुका ह्मणे कुश्चळ मनीं । विटंबनीं पडिलीं तीं ॥3॥ [[वर्ग:गाथा]] pju7ot7nx2obkgfp11h7x5i8yrth333 तुकाराम गाथा/ २७०१ ते ३००० 0 1542 36905 36881 2026-09-19T19:41:49Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36905 wikitext text/x-wiki 2701 चोराचिया धुडका मनीं । वसे ध्यानीं लंछन ॥1॥ ऐशा आह्मीं करणें काय । वरसो न्यायें पर्जन्य ॥ध्रु.॥ ज्याच्या बैसे खतावरी । ते चुरचुरी दुखवूनि ॥2॥ तुका ह्मणे ज्याची खोडी । त्याची जोडी त्या पीडी ॥3॥ 2702 बुिद्धहीना उपदेश । तें तें विष अमृतीं ॥1॥ हुंगों नये गो†हवाडी । तेथें जोडी विटाळ ॥ध्रु.॥ अळसियाचे अंतर कुडें। जैसें मढें निष्काम ॥2॥ तुका ह्मणे ऐशा हाती । मज श्रीपती वांचवा ॥3॥ 2703 न करीं तुमची सेवा । बापुडें मी पण देवा । बोलिलों तो पाववा । पण सिद्धी सकळ ॥1॥ आणीक काय तुह्मां काम । आह्मां नेदा तरी प्रेम । कैसे धर्माधर्म । निश्चयेंसी रहाती ॥ध्रु.॥ आह्मीं वेचलों शरीरें । तुझी बीज पेरा खरें । संयोगाचें बरें । गोड होतें उभयतां ॥3॥ एका हातें टाळी । कोठें वाजते निराळी । जाला तरी बळी । स्वामीविण शोभेना ॥3॥ रूपा यावे जी अनंता । धरीन पुटाची त्या सत्ता । होइऩन सरता । संतांमाजी पोसणा ॥4॥ ठेविलें उधारा । वरी काय तो पातेरा । तुका ह्मणे बरा । रोकडा चि निवाड ॥5॥ 2704. भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥1॥ हे तों चाळवाचाळवी । केलें आपण चि जेवी ॥ध्रु.॥ नैवेद्याचा आळ । वेच ठाकणीं सकळ ॥2॥ तुका ह्मणे जड । मज न राखावें दगड ॥3॥ 2705 सर्व भाग्यहीन । ऐसें सांभािळलों दीन ॥1॥ पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥ जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥2॥ तुका ह्मणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥3॥ 2706 भाग्याचा उदय । ते हे जोडी संतपाय ॥1॥ येथूनिया नुठो माथा । मरणांवाचूनि सर्वथा ॥ध्रु.॥ होइप बळकट । माझ्या मना तूं रे धीट ॥2॥ तुका ह्मणे लोटांगणीं । भिHभाग्यें जाली धणी ॥3॥ 2707 नाहीं तरी आतां कैचा अनुभव । जालासीं तूं देव घरघेणा ॥1॥ जेथें तेथें देखें लांचाचा पर्वत । घ्यावें तरि चित्त समाधान ॥ध्रु.॥ आधीं वरी हात या नांवें उदार । उसण्याचे उपकार फिटाफीट ॥2॥ तुका ह्मणे जैसी तैसी करूं सेवा । सामर्थ्य न देवा पायांपाशीं ॥3॥ 2708 आह्मी सर्वकाळ कैंचीं सावधानें । वेवसायें मन अभ्यासलें ॥1॥ तरी ह्मणा मोट ठेविली चरणीं । केलों गुणागुणीं कासावीस ॥ध्रु.॥ याचे कानसुळीं मारीतसे हाका । मज घाटूं नका मधीं आतां ॥2॥ तुका ह्मणे निद्रा जागृति सुषुिप्त । तुह्मी हो श्रीपती साक्षी येथें ॥3॥ 2709 नसता चि दाउनि भेव । केला जीव हिंपुटी ॥1॥ जालों तेव्हां कळलें जना । वाउगा हा आकांत ॥ध्रु.॥ गंवसिलों पुढें मागें लागलागे पावला ॥2॥ तुका ह्मणे केली आणि । सलगीच्यांनी सन्मुख ॥3॥ 2710 हें का आह्मां सेवादान । देखों सीण विषमाचा ॥1॥ सांभाळा जी ब्रीदावळी । तुह्मीं कां कळीसारिखे ॥ध्रु.॥ शरणागत वै†या हातीं । हे नििंश्चती देखिली ॥2॥ तुका ह्मणे इच्छीं भेटी । पाय पोटीं उफराटे ॥3॥ 2711 कां हो आलें नेणों भागा । पांडुरंगा माझिया ॥1॥ उफराटी तुह्मां चाली । क्रिया गेली सत्याची ॥ध्रु.॥ साक्षी हेंगे माझें मन । आर्त कोण होतें तें ॥2॥ तुका ह्मणे समर्थपणे । काय नेणें करीतसां ॥3॥ 2712 शकुनानें लाभ हानि । येथूनि च कळतसे ॥1॥ भयारूढ जालें मन । आतां कोण विश्वास ॥ध्रु.॥ प्रीत कळे आलिंगनीं। संपादनीं अत्यंत ॥2॥ तुका ह्मणे मोकलिलें । कळों आलें बरवें हें॥3॥ 2713 नव्हेव निग्रह देहासी दंडण । न वजे भूकतान सहावली ॥1॥ तरि नित्य नित्य करीं आळवण । माझा अभिमान असों द्यावा ॥ध्रु.॥ नाहीं विटािळलें कायावाचामन । संकल्पासी भिन्न असें चि या ॥2॥ तुका ह्मणे भवसागरीं उतार । कराया आधार इच्छीतसें ॥3॥ 2714 ऐकिली कीिर्त्त संतांच्या वदनीं । तरि हें ठाकोनि आलों स्थळ ॥1॥ मागिला पुढिला करावें सारिखें । पालटों पारिखें नये देवा ॥ध्रु.॥ आह्मासी विश्वास नामाचा आधार । तुटतां हे थार उरी नाहीं ॥2॥ तुका ह्मणे येथें नसावें चि दुजें । विनंती पंढरिराजें परिसावी हे ॥3॥ 2715 मोलाचें आयुष्य वेचतसे सेवे । नुगवतां गोवे खेद होतो ॥1॥ उगवूं आलेति तुह्मीं नारायणा । परिहार या सिणा निमिस्यांत ॥ध्रु.॥ लिगाडाचे मासी न्यायें जाली परी । उरली ते उरी नाहीं कांहीं ॥2॥ तुका ह्मणे लाहो साधीं वाचाबळें । ओढियेलों काळें धांव घाला ॥3॥ 2716 ह्मणऊनि जालों क्षेत्रींचे संन्यासी । चित्त आशापाशीं आवरूनि ॥1॥ कदापि ही नव्हे सीमा उल्लंघन । केलें विसर्जन आव्हानीं च ॥ध्रु.॥ पारिखा तो आतां जाला दुजा ठाव । दृढ केला भाव एकविध ॥2॥ तुका ह्मणे कार्यकारणाचा हेवा । नाहीं जीव देवा समपिऩला ॥3॥ 2717 विभ्रंशिली बुिद्ध देहांत जवळी । काळाची अकाळीं वायचाळा ॥1॥ पालटलें जैसें देंठ सोडी पान । पिकलें आपण तयापरी ॥ध्रु.॥ न मारितां हीन बुिद्ध दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥2॥ तुका ह्मणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥3॥ 2718 न वजावा तो काळ वांयां । मुख्य दया हे देवा ॥1॥ ह्मणऊनि जैसें तैसें । रहणी असें पायांचे ॥ध्रु.॥ मोकळें हे मन कष्ट। करी नष्ट दुर्जन ॥2॥ तुका ह्मणे कांहीं नेणें । न वजें येणेंपरी वांयां ॥3॥ 2719 कल्पतरूअंगीं इिच्छलें तें फळ । अभागी दुर्बळ भावें सिद्धी ॥1॥ धन्य त्या जाती धन्य त्या जाती । नारायण चित्तीं सांठविला ॥ध्रु.॥ बीजाऐसा द्यावा उदकें अंकुर । गुणाचे प्रकार ज्याचे तया ॥2॥ तुका ह्मणे कळे पारखिया हिरा । ओझें पाठी खरा चंदनाचें ॥3॥ 2720 उकरडा आधीं अंगीं नरकाडी । जातीची ते जोडी ते चि चित्तीं ॥1॥ कासयानें देखे अंधळा माणिकें । चवीविण फिके वांयां जाय ॥ध्रु.॥ काय जाणे विष पालटों उपचारें । मुखासी अंतर तों चि बरें ॥2॥ तुका ह्मणे काय उपदेश वेडएा । संगें होतो रेडएासवें कष्ट ॥3॥ 2721 जया शिरीं कारभार । बुिद्ध सार तयाची ॥1॥ वर्ते तैसें वर्ते जन । बहुतां गुण एकाचा ॥ध्रु.॥ आपणीयां पाक करी । तो इतरीं सेविजे ॥2॥ तुका ह्मणे शूर राखे । गाढएा वाखेसांगातें॥3॥ 2722 एक एका साहए करूं । अवघें धरूं सुपंथ ॥1॥ कोण जाणे कैसी परी । पुढें उरी ठेवितां ॥ध्रु.॥ अवघे धन्य होऊं आता । स्मरवितां स्मरण ॥2॥ तुका ह्मणे अवघी जोडी । ते आवडा चरणांची ॥3॥ 2723 फळकट तो संसार । येथें सार भगवंत ॥1॥ ऐसें जागवितों मना । सरसें जनासहित ॥ध्रु.॥ अवघें निरसूनि काम । घ्यावें नाम विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे देवाविण । केला सीण तो मिथ्या ॥3॥ 2724 सुधारसें ओलावली । रसना धाली न धाय ॥1॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्णता ॥ध्रु.॥ आवडे तें तें च यासी । ब्रह्मरसीं निरसें ॥2॥ तुका ह्मणे बहुतां परी । करूनि करीं सेवन ॥3॥ 2725 असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर । ब्रह्म तें विकारविरहित॥1॥ तरि ह्मणा त्याग प्रतिपादलासे । अनादि हा असे वैराकार ॥ध्रु.॥ सिजलें हिरवें एका नांवें धान्य । सेवनापें भिन्न निवडे तें ॥2॥ तुका ह्मणे भूतीं साक्ष नारायण । अवगुणीं दंडण गुणीं पुजा ॥3॥ 2726 आपुलें आपण जाणावें स्वहित । जेणें राहे चित्त समाधान ॥1॥ बहुरंगें माया असे विखरली । कुंटित चि चाली होतां बरी ॥ध्रु.॥ पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारीं । भाव विश्वंभरीं समर्पावा ॥2॥ तुका ह्मणे गेला फिटोनियां भेव । मग होतो देव मनाचा चि ॥3॥ 2727 असोनि न कीजे अलिप्त अहंकारें । उगी च या भारें कुंथाकुंथी ॥1॥ धांवा सोडवणें वेगीं लवकरी । मी तों जालों हरी शिHहीन ॥ध्रु.॥ भ्रमल्यानें दिसें बांधल्याचेपरी । माझें मजवरी वाहोनियां ॥2॥ तुका ह्मणे धांव घेतलीसे सोइऩ । आतां पुढें येइप लवकरी ॥3॥ 2728 आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटीं पारिख्या॥1॥ ऐसें जन भुललें देवा । मिथ्या हेवा वाढवी ॥ध्रु.॥ गळ गिळी आविसें मासा । प्राण आशा घेतला ॥2॥ तुका ह्मणे बोकडमोहो । धरी पहा हो खाटिक ॥3॥ 2729 विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥1॥ शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥ अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥2॥ तुका ह्मणे ग्यानगड । सुखें देवा पावेना नाड ॥3॥ 2730 मी च विखळ मी च विखळ । येर सकळ बहु बरें॥1॥ पाहिजे हें क्षमा केलें । येणें बोलें विनवणी ॥ध्रु.॥ मी च माझें मी च माझें । जालें ओझें अन्याय ॥2॥ आधीं आंचवला आधीं आंचवला । तुका जाला निमनुष्य ॥3॥ 2731 येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥1॥ ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥ भय निवारिता कोण वेगळा अनंता ॥2॥ तुका ह्मणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥3॥ 2732 भल्याचें कारण सांगावें स्वहित । जैसी कळे नीत आपणासी ॥1॥ परी आह्मी असों एकाचिये हातीं । नाचवितो चित्तीं त्याचें तैसें ॥ध्रु.॥ वाट सांगे त्याच्या पुण्या नाहीं पार । होती उपकार अगणित ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी बहु कृपावंत । आपुलें उचित केलें संतीं ॥3॥ 2733 लावूनियां पुष्टी पोरें । आणि करकर कथेमाजी ॥1॥ पडा पायां करा विनंती । दवडा हातीं धरोनियां ॥ध्रु.॥ कुर्वाळूनि बैसे मोहें । प्रेम कां हे नासीतसे ॥2॥ तुका ह्मणे वाटे चित्त । करा फजित ह्मणऊनि ॥3॥ 2734 पुण्य उभें राहो आतां । संताचें याकारणें ॥1॥ पंढरीचे लागा वाटे । सखा भेटे विठ्ठल ॥ध्रु.॥ संकल्प हे यावे फळा । कळवळा बहुतांचा ॥2॥ तुका ह्मणे होऊनि क्षमा । पुरुषोत्तमा अपराध ॥3॥ 2735 आइकिली मात । पुरविले मनोरथ ॥ ॥ प्रेम वाढविलें देवा । बरवी घेऊनियां सेवा ॥ध्रु.॥ केली विनवणी । तैसी पुरविली धणी ॥2॥ तुका ह्मणे काया । रसा कुरोंडी वरोनियां ॥3॥ 2736 संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥1॥ संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृित्त अखंडित ॥ध्रु.॥ दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वासी ॥2॥ निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळे ॥3॥ 2737 सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥1॥ राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥ भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥2॥ तुका ह्मणे मज नाहीं जी भरवसा । तोवरि सहसा निवाडु तो ॥3॥ 2738 न सरे भांडार । भरलें वेचितां अपार ॥1॥ मवित्याचें पोट भरे । पुढिलासी पुढें उरे ॥ध्रु.॥ कारणापुरता लाहो आपुलाल्या हिता ॥2॥ तुका ह्मणे देवा । पुढें केला चाले हेवा ॥3॥ 2739 तरी हांव केली अमुपा व्यापारें । व्हावें एकसरें धनवंत ॥1॥ जालों हरिदास शूरत्वाच्या नेमें । जालीं ठावीं वर्में पुढिलांची ॥ध्रु.॥ जनावेगळें हें असे अभिन्नव । बळी दिला जीव ह्मणऊनि ॥2॥ तुका ह्मणे तरी लागलों विल्हेसी । चालतिया दिसीं स्वामी ॠणी ॥3॥ 2740 कोण दुजें हरी सीण । शरण दीन आल्याचा ॥1॥ तुह्मांविण जगदीशा । उदार ठसा त्रिभुवनीं ॥ध्रु.॥ कोण ऐसें वारी पाप । हरी ताप जन्माचा ॥2॥ तुका ह्मणे धांव घाली । कोण चाली मनाचे ॥3॥ 2741 ग्रंथाचे अर्थ नेणती हे खळ । बहु अनर्गळ जाले विषयीं ॥1॥ नाहीं भेदू ह्मुण भलतें चि आचरे । मोकळा विचरे मनासवें ॥2॥ तुका ह्मणे विषा नांव तें अमृत । पापपुण्या भीत नाहीं नष्ट ॥3॥ 2742 कायावाचामनें जाला विष्णुदास । काम क्रोध त्यास बाधीतना ॥1॥ विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता । सकळ भोगिता होय त्याचें ॥2॥ तुका ह्मणे चित्त करावें निर्मळ । येऊनि गोपाळ राहे तेथें ॥3॥ 2743 याती हीन मति हीन कर्म हीन माझें । सांडोनियां सर्व लज्जा शरण आलों तुज ॥1॥ येइप गा तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीण जाला क्षीण जाली काया ॥ध्रु.॥ दिनानाथ दीनबंधू नाम तुज साजे । पतितपावन नाम ऐसी ब्रीदावळी गाजे॥2॥ विटेवरि वीट उभा कटावरी कर । तुका ह्मणे हें चि आह्मां ध्यान निरंतर ॥3॥ 2744 गंगा आली आम्हांवरि । संतपाउलें साजिरीं ॥1॥ तेथें करीन मी अंघोळी । उडे चरणरजधुळी । येती तीर्थावळी । पर्वकाळ सकळ ॥ध्रु.॥ पाप पळालें जळालें । भवदुःख दुरावलें॥2॥ तुका ह्मणे धन्य जालों । सप्तसागरांत न्हालों ॥3॥ 2745 पोटासाठीं खटपट करिसी अवघा वीळ । राम राम ह्मणतां तुझी बसली दांतखीळ ॥1॥ हरिचें नाम कदाकाळीं कां रे नये वाचे । ह्मणतां राम राम तुझ्या बाचें काय वेचें ॥ध्रु.॥ द्रव्याचिया आशा तुजला दाही दिशा न पुरती । कीर्तनासी जातां तुझी जड झाली माती ॥2॥ तुका ह्मणे ऐशा जीवा काय करूं आता । राम राम न ह्मणे त्याचा गाढव मातापिता ॥3॥ 2746 आह्मां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥1॥ घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥ वाहे बंदर द्वारका । खेप आली पुंडलिका । उभे चि विकिलें एका । सनकादिकां सांपडलें ॥2॥ धन्य धन्य हे भूमंडळी । प्रगटली नामावळी । घेती जीं दुबळीं । तीं आगळीं सदैव ॥3॥ माप आपुलेनि हातें । कोणी नाहीं निवारितें । पैस करूनि चित्तें । घ्यावें हितें आपुलिया ॥4॥ नाहीं वाटितां सरलें । आहे तैसें चि भरलें । तुका ह्मणे गेलें । वांयांविण न घेतां ॥5॥ 2747 चुकलिया ताळा । वाती घालुनि बैसे डोळां ॥1॥ तैसें जागें करीं चित्ता । कांहीं आपुलिया हिता ॥ध्रु.॥ निक्षेपिलें धन। तेथें गुंतलेसे मन ॥2॥ नाशिवंतासाटीं । तुका ह्मणे करिसी आटी ॥3॥ 2748 करूनि जतन । कोणा कामा आलें धन ॥1 ॥ ऐसें जाणतां जाणतां । कां रे होतोसी नेणता ॥ध्रु.॥ िप्रया पुत्र बंधु । नाहीं तुज यांशीं संबंधु ॥2॥ तुका ह्मणे एका । हरीविण नाहीं सखा ॥3॥ 2749 आह्मीं देतों हाका । कां रे जालासी तूं मुका ॥1॥ न बोलसी नारायणा । कळलासी क्रियाहीना ॥ध्रु.॥ आधीं करूं चौघाचार। मग सांडूं भीडभार ॥2॥ तुका ह्मणे सेवटीं । तुह्मां आह्मां घालूं तुटी ॥3॥ 2750 नव्हे भिडा हें कारण । जाणे करूं ऐसे जन ॥1॥ जों जों धरावा लौकिक । रडवितोसी आणीक ॥ध्रु.॥ चाल जाऊं संतांपुढें । ते हें निवडिती रोकडें ॥2॥ तुका ह्मणे तूं निर्लज्ज । आह्मां रोकडी गरज ॥3॥ 2751 बहु होता भला । परि ये रांडेनें नासिला ॥1॥ बहु शिकला रंग चाळे । खरें खोटें इचे वेळे ॥ध्रु.॥ नव्हतें आळवितें कोणी । इनें केला जगॠणी ॥2॥ ज्याचे त्यासी नेदी देऊं । तुका ह्मणे धांवे खाऊं ॥3॥ 2752 काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥1॥ नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥ होय आपुलें काज । तों हे भीड सांडूं लाज ॥2॥ तुका ह्मणे देवा । आधीं निवडूं हा गोवा ॥3॥ 2753 केली सलगी तोंडपिटी । आह्मी लडिवाळें धाकुटीं॥1॥ न बोलावें तें चि आलें । देवा पाहिजे साहिलें ॥ध्रु.॥ अवघ्यांमध्यें एक वेडें । तें चि खेळविती कोडें ॥2॥ तुका ह्मणे मायबापा । मजवरि कोपों नका ॥3॥ 2754 शिकवूनि बोल । केलें कवतुक नवल ॥1॥ आपणियां रंजविलें । बापें माझिया विठ्ठलें ॥ध्रु.॥ हातीं प्रेमाचें भातुकें । आह्मां देऊनियां निकें ॥2॥ तुका करी टाहो । पाहे रखुमाइऩचा नाहो ॥3॥ 2755 तेथें सुखाची वसति । गाती वैष्णव नाचती । पताका झळकती । गर्जती हरिनामें ॥1॥ दोषा जाली घेघेमारी । पळती भरले दिशा चारी । न येती माघारीं । नाहीं उरी परताया ॥ध्रु.॥ विसरोनि देवपणा । उभा पंढरीचा राणा । विटोनि निर्गुणा । रूप धरिलें गोजिरें ॥2॥ पोट सेवितां न धाये । भूक भुकेली च राहे । तुका ह्मणे पाहे । कोण आस या मुHीची ॥3॥ 2756 शूद्रवंशी जन्मलों । ह्मणोनि दंभें मोकलिलों ॥1॥ अरे तूं चि माझा आतां । मायबाप पंढरीनाथा ॥ध्रु.॥ घोकाया अक्षर। मज नाहीं अधिकार ॥2॥ सर्वभावें दीन । तुका ह्मणे यातिहीन ॥3॥ 2757 वेडें वांकडें गाइऩन । परि मी तुझा चि ह्मणवीन॥1॥ मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥ केल्या अपराधांच्या राशीं । ह्मणऊनि आलों तुजपाशीं ॥2॥ तुका ह्मणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥3॥ 2758 हरिभH माझे जिवलग सोइरे । हृदयीं पाउले धरिन त्यांचे ॥1॥ अंतकाळीं येती माझ्या सोडवणे । मस्तक बैसणें देइन त्यांसी ॥ध्रु.॥ आणिक सोइरे सज्जन वो कोणी । वैष्णवांवांचोनि नाहीं मज ॥2॥ देइन आिंळगण धरीन चरण । संवसारसीण नासे तेणें ॥3॥ कंठीं तुळशीमाळा नामाचे धारक । ते माझे तारक भवनदीचे ॥4॥ तयांचे चरणीं घालीन मी मिठी । चाड हे वैकुंठीं नाहीं मज ॥5॥ अळसें दंभें भावें हरिचें नाम गाती । ते माझे सांगाती परलोकींचे ॥6॥ कायावाचामनें देइन क्षेम त्यासी । चाड जीवित्वासी नाहीं मज ॥7॥ हरिचें नाम मज म्हणविती कोणी । तया सुखा धणी धणी वरी ॥8॥ तुका ह्मणे तया उपकारें बांधलों। ह्मणऊनि आलों शरण संतां ॥9॥ 2759 लटिका तो प्रपंच एक हरि साचा । हरिविण आहाच सर्व इंिद्रयें ॥1॥ लटिकें तें मौन्य भ्रमाचें स्वप्न । हरिविण ध्यान नश्वर आहे ॥ध्रु.॥ लटिकिया विपित्त हरिविण करिती । हरि नाहीं चित्तीं तो शव जाणा ॥2॥ तुका ह्मणे हरि हें धरिसी निर्धारीं । तरीं तूं झडकरी जासी वैकुंठा ॥3॥ 2760 सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥1॥ मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥ लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशधडी ॥2॥ शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥3॥ तुका ह्मणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥4॥ 2761 एकांतांचे सुख देइप मज देवा । आघात या जीवा चुकवूनि ॥1॥ ध्यानीं रूप वाचे नाम निरंतर । आपुला विसर पडों नेदीं ॥ध्रु.॥ मायबाळा भेटी सुखाची आवडी । तैशी मज [[गोड]]ी देइप देवा ॥2॥ कीर्ती ऐकोनियां जालों शरणांगत । दासाचें तूं हित करितोसी ॥3॥ तुका ह्मणे मी तों दीन पापराशी । घालावें पाठीशी मायबापा ॥4॥ 2762 लटिकें तें Yाान लटिकें ते ध्यान । जरि हरिकिर्तन िप्रय नाहीं ॥1॥ लटिकें चि दंभ घातला दुकान । चाळविलें जन पोटासाटीं ॥ध्रु.॥ लटिकें चि केलें वेदपारायण । जरि नाहीं स्काुंफ्दन प्रेम कथे ॥2॥ लटिकें तें तप लटिका तो जप । अळस निद्रा झोप कथाकाळीं ॥3॥ नाम नावडे तो करील बाहेरी । नाहीं त्याची खरी चित्तशुिद्ध ॥4॥ तुका ह्मणे ऐसीं गर्जती पुराणें । शिष्टांची वचनें मागिला ही ॥5॥ 2763 भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥1॥ ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥ माझें तुझें हा विकार । निरसतां एकंकार । न लगे कांहीं फार । विचार चि करणें ॥2॥ तुका ह्मणे दुजें । हें तों नाहीं सहजें । संकल्पाच्या काजें । आपें आप वाढलें ॥3॥ 2764 नेणें काुंफ्कों कान । नाहीं एकांतींचें Yाान ॥1॥ तुह्मी आइका हो संत । माझा सादर वृत्तांत ॥ध्रु.॥ नाहीं देखिला तो डोळां। देव दाखवूं सकळां ॥2॥ चिंतनाच्या सुखें । तुका ह्मणे नेणें दुःखें ॥3॥ 2765 त्याग तरी ऐसा करा । अहंकारा दवडावें ॥1॥ मग जैसा तैसा राहें । काय पाहें उरलें तें ॥ध्रु.॥ अंतरींचें विषम गाढें । येऊं पुढें नेदावें ॥2॥ तुका ह्मणे शुद्ध मन । समाधान पाहिजे॥3॥ 2766 मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्यािप्त ॥1॥ देह विसरे आपुला । जवळीं घेतां सीण गेला ॥ध्रु.॥ दावी प्रेमभातें। आणि अंगावरि चढतें ॥2॥ तुका संतापुढें । पायीं झोंबे लाडें कोडें॥3॥ 2767 कोणा पुण्या फळ आलें । आजि देखिलीं पाउलें॥1॥ ऐसें नेणें नारायणा । संतीं सांभािळलें दीना ॥ध्रु.॥ कोण लाभकाळ। दीन आजि मंगळ ॥2॥ तुका ह्मणे जाला । लाभ सहज विठ्ठला॥3॥ 2768 मान इच्छी तो अपमान पावे । अमंगळ सवे अभाग्याची॥1॥ एकाचिये अंगीं दुजियाचा वास । आशा पुढें नाश सिद्ध करी ॥ध्रु.॥ आधीं फळासी कोठें पावों शके । वासनेची भिकेवरी चाली ॥2॥ तुका ह्मणे राजहंस ढोरा नांव । काय तया घ्यावें अळंकाराचें ॥3॥ 2769 संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जाणें । करितां न सरे अधिक वाट पाहीं । तृष्णा देशधडी केलों। भिHभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों। मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेिष्टलों ॥1॥ आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची । करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची॥ध्रु.॥ इंिद्रयें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान । नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय। क्षण एक िस्थर नाहीं । करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी। न चले माझें यास कांहीं ॥2॥ शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु। धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ । सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें । तुका ह्मणे हरी राखे भलत्या परी । आह्मी तुझीं शरणागतें ॥3॥ 2770 नाम घेतां उठाउठीं । होय संसारासी तुटी ॥1॥ ऐसा लाभ बांधा गांठी । विठ्ठलपायीं पडे मिठी ॥ध्रु.॥ नामापरतें साधन नाहीं । जें तूं करिशी आणिक कांहीं ॥2॥ हाकारोनि सांगे तुका । नाम घेतां राहों नका ॥3॥ 2771 प्राण समपिऩला आह्मी । आतां उशीर कां स्वामी॥1॥ माझें फेडावें उसणें । भार न मना या ॠणें ॥ध्रु.॥ जाला कंठस्फोट। जवळी पातलों निकट ॥2॥ तुका ह्मणे सेवा । कैसी बरी वाटे देवा॥3॥ 2772 येणें मागॉ आले । त्यांचें निसंतान केलें ॥1॥ ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥ नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥2॥ तुका ह्मणे चोर । तो हा उभा कटिकर ॥3॥ 2773 तोंवरि तोंवरि जंबुक करि गर्जना । जंव त्या पंचानना देखिलें नाहीं ॥1॥ तोंवरि तोवरिं सिंधु करि गर्जना । जंव त्या अगिस्तब्राह्मणा देखिलें नाहीं ॥ध्रु.॥ तोंवरि तोंवरि वैराग्याच्या गोष्टी। जंव सुंदर वनिता दृष्टी पडिली नाहीं ॥2॥ तोंवरि तोंवरि शूरत्वाच्या गोष्टी । जंव परमाइऩचा पुत्र दृष्टी देखिला नाहीं ॥3॥ तोंवरि तोंवरि माळामुद्रांचीं भूषणें । जंव तुक्याचें दर्शन जालें नाहीं॥4॥ 2774 तोंवरि तोंवरि शोभतील गारा । जंव नाहीं हिरा प्रकाशला ॥1॥ तोंवरि तोंवरि शोभतील दीपिका । नुगवता एका भास्करासी ॥2॥ तोंवरि तोंवरि सांगती संताचिया गोष्टी । जंव नाहीं भेटी तुक्यासवें ॥3॥ 2775 धरोनि दोन्ही रूपें पाळणें संहार । करी कोप रुद्र दयाळ विष्णु ॥1॥ जटाजूट एका मुगुट माथां शिरीं । कमळापति गौरीहर एक ॥ध्रु.॥ भस्मउद्धळण लIमीचा भोग । शंकर श्रीरंग उभयरूपीं ॥2॥ वैजयंती माळा वासुगीचा हार । लेणें अळंकार हरिहरा ॥3॥ कपाळ झोळी एका स्मशानींचा वास । एक जगन्निवास विश्वंभर ॥4॥ तुका ह्मणे मज उभयरूपीं एक । सारोनि संकल्प शरण आलों ॥5॥ 2776 उचिताचा भाग होतों राखोनियां । दिसती ते वांयां कष्ट गेले ॥1॥ वचनाची कांहीं राहे चि ना रुचि । खळाऐसें वाची कुची जालें ॥ध्रु.॥ विश्वासानें माझें बुडविलें घर । करविला धीर येथवरी ॥2॥ तुका ह्मणे शेकीं थार नाहीं बुड । कैसें तुह्मीं कोड पुरविलें ॥3॥ 2777 लांब लांब जटा काय वाढवूनि । पावडें घेऊनि क्रोधें चाले ॥1॥ खायाचा वोळसा शिव्या दे जनाला । ऐशा तापशाला बोध कैंचा ॥ध्रु.॥ सेवी भांग अफू तमाखू उदंड । परि तो अखंड भ्रांतीमाजी ॥2॥ तुका ह्मणे ऐसा सर्वस्वें बुडाला । त्यासी अंतरला पांडुरंग ॥3॥ 2778 अवघीं च तीथॉ घडलीं एकवेळा । चंद्रभागा डोळां देखिलिया ॥1॥ अवघीं च पापें गेलीं दिगांतरीं । वैकुंठ पंढरी देखिलिया ॥ध्रु.॥ अवघिया संतां एकवेळा भेटी । पुंडलीक दृष्टी देखिलिया ॥2॥ तुका ह्मणे जन्मा आल्याचें सार्थक । विठ्ठल चि एक देखिलिया ॥3॥ 2779 सदा सर्वकाळ अंतरीं कुटिल । तेणें गळां माळ घालूं नये ॥1॥ ज्यासी नाहीं दया क्षमा शांति । तेणें अंगीं विभूती लावूं नये ॥ध्रु.॥ जयासी न कळे भHीचें महिमान । तेणें ब्रह्मYाान बोलों नये ॥2॥ ज्याचें मन नाहीं लागलें हातासी । तेणें प्रपंचासी टाकुं नये ॥3॥ तुका ह्मणे ज्यासी नाहीं हरिभिH । तेणें भगवें हातीं धरूं नये ॥4॥ 2780 आह्मी असों नििंश्चतीनें । एक्या गुणें तुमचिया॥1॥ दुराचारी तरले नामें । घेतां प्रेम ह्मणोनि ॥ध्रु.॥ नाहीं तुह्मां धांव घेता। कृपावंता आळस ॥2॥ तुका ह्मणे विसरूं कांहीं । तुज वो आइऩ विठ्ठले ॥3॥ 2781 अनुभवें वदे वाणी । अंतर ध्यानीं आपुलें ॥1॥ कैंची चिका दुधचवी । जरी दावी पांढरें ॥ध्रु.॥ जातीऐसा दावी रंग। बहु जग या नावें ॥2॥ तुका ह्मणे खद्योत ते । ढुंगाभोंवतें आपुलिया ॥3॥ 2782 परपीडक तो आह्मां दावेदार । विश्वीं विश्वंभर ह्मणऊनि॥1॥ दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥ अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥2॥ तुका ह्मणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्तें ॥3॥ 2783 कांहीं न मागे कोणांसी । तो चि आवडे देवासी॥1॥ देव तयासी ह्मणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ध्रु.॥ भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥2॥ नाहीं नाहीं त्यासमान । तुका ह्मणे मी जमान ॥3॥ 2784 नाम उच्चारितां कंटीं । पुढें उभा जगजेठी ॥1॥ ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥ ब्रह्मादिकांच्या ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥2॥ तुका ह्मणे सार घ्यावें । मनें हरिरूप पाहावें ॥3॥ 2785 आडलिया जना होसी सहाकारी । अंधिळयाकरीं काठी तूं चि ॥1॥ आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥ प्रल्हाद महासंकटीं रिक्षला । तुह्मी अपंगिला नानापरी ॥2॥ आपुलें चि अंग तुह्मी वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥3॥ तुका ह्मणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाइऩ जननीये ॥4॥ 2786 तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंिद्रयांचा ॥1॥ ह्मणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥ पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥2॥ तुका ह्मणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥3॥ 2787 गुरुशिष्यपण । हें तों अधमलक्षण ॥1॥ भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥ न कळतां दोरी साप। राहूं नेंदावा तो कांप ॥2॥ तुका ह्मणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥3॥ 2788 अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥1॥ अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥ ब्रह्महत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥2॥ तुका ह्मणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥3॥ 2789 धनवंता घरीं । करी धन चि चाकरी ॥1॥ होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावें चि घर ॥ध्रु.॥ रानीं वनीं दीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥2॥ तुका ह्मणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥3॥ 2790 हा गे माझा अनुभव । भिHभाव भाग्याचा ॥1॥ केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥ घालोनियां भार माथा। अवघी चिंता वारली ॥2॥ तुका ह्मणे वचन साटीं । नाम कंठीं धरोनि ॥3॥ 2791 देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुभिऩक्षा ॥1॥ नेणती हा करूं सांटा । भरले फांटा आडरानें ॥ध्रु.॥ वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥2॥ तुका ह्मणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥3॥ 2792 खुंटोनियां दोरी आपणियांपाशीं । वावडी आकाशीं मोकलिली ॥1॥ आपुलिया आहे मालासी जतन । गाहाणाचे ॠण बुडों नेणें ॥ध्रु.॥ बीज नेलें तेथें येइऩल अंकुर । जतन तें सार करा याची ॥2॥ तुका ह्मणे माझी नििंश्चतीची सेवा । वेगळें नाहीं देवा उरों दिलें ॥3॥ 2793 शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥1॥ कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥ यYामुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥2॥ तुका ह्मणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥3॥ 2794 मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥1॥ या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥ रोजकीदव होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥2॥ तुका ह्मणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥3॥ 2795 स्मशानीं आह्मां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥1॥ नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥ झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तइप दान तुह्मीं केलें ॥2॥ तुका ह्मणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥3॥ 2796 आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥1॥ लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥ उभारिला कर प्रसिद्ध या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥2॥ तुका ह्मणे होय दरिद्र वििच्छन्न । ऐसे देऊं दान एकवेळे ॥3॥ 2797 दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥1॥ अिग्न काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥ तुका ह्मणे मुख मळीण दर्पणीं । उजिळल्यावांचूनि कैसें भासे ॥2॥ 2798 नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥1॥ काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥ सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥2॥ तुका ह्मणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥3॥ 2799 पुढें जेणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥1॥ येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥ होणारासी मिळे बुिद्ध । नेदी शुद्धी धरूं तें ॥2॥ तुका ह्मणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥3॥ 2800 ऐका गा ए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥1॥ अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥ध्रु.॥ नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥2॥ बरवा अवकाश आहे । करा साहे इंिद्रयें ॥3॥ कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥4॥ तुका ह्मणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥5॥ 2801 संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥1॥ ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥ संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥2॥ तुका ह्मणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥3॥ 2802 गेले पळाले दिवस रोज । काय ह्मणतोसि माझें माझें ॥1॥ सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥ कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥2॥ हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥3॥ तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥4॥ तुका ह्मणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥5॥ 2803 आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त॥1॥ फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥ प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥3॥ 2804 कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा॥1॥ अंगीं असोनियां बळ । होसी खटएाळ नाठएाळ ॥ध्रु.॥ आह्मां नरकासी जातां । काय येइल तुझ्या हातां ॥2॥ तुका ह्मणे कान्हा। क्रियानष्टा नारायणा ॥3॥ 2805 माझे पाय तुझी डोइऩ । ऐसें करिं गा भाक देइप ॥1॥ पाहतां तंव उफराटें । घडे तइऩ भाग्य मोठें ॥ध्रु.॥ बहु साधन मोलाच। यासी जोडा दुजें कैचें ॥2॥ नका अनमानूं विठ्ठला । तुका ह्मणे धडा जाला ॥3॥ 2806 पवित्र तें अन्न । हरिचिंतनीं भोजन ॥1॥ येर वेठएा पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥ जेऊनि तो धाला । हरिचिंतनीं केला काला ॥2॥ तुका ह्मणे चवी आलें । जें कां मििश्रत विठ्ठलें॥3॥ 2807 चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥1॥ अंध पारखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥ काय नाहीं सत्ता। हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥2॥ तुका ह्मणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥3॥ 2808 बिळवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥1॥ पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥ आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥3॥ 2809 कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥1॥ जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥ कैं भौज्य नानापरी । कैं कोरडएा [[भाकरी]] ॥2॥ कैं बसावें वहनीं । कैं पायीं अन्हवाणी ॥3॥ कैं उत्तम प्रावणॉ । कैं वसनें तीं जीणॉ ॥4॥ कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥5॥ कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥6॥ तुका ह्मणे जाण । सुख दुःख तें समान ॥7॥ 2810 उंचनिंच नेणे कांहीं भगवंत । तिष्ठे भाव भH देखोनियां ॥1॥ दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्या घरीं रक्षी प्रल्हादासी ॥ध्रु.॥ चर्म रंगूं लागे रोहिदासा संगीं । कबिराचे मागीं विणी शेले ॥2॥ सजनकसाया विकुं लागे मास । मळा सांवत्यास खुरपूं लागे ॥3॥ नरहरिसोनारा घडों काुंफ्कुं लागे । चोख्यामेऑया संगें ढोरें ओढी ॥4॥ नामयाची जनी सवें वेची शेणी । धर्मा घरीं पाणी वाहे झाडी ॥5॥ नाम्यासवें जेवी नव्हे संकोचित । Yाानियाची भिंत अंगीं ओढी ॥6॥ अर्जुनाचीं घोडीं हाकी हा सारथी । भक्षी पोहे प्रीती सुदाम्याची ॥7॥ गौिळयांचे घरीं गाइऩ अंगें वळी । द्वारपाळ बळीद्वारीं जाला ॥8॥ यंकोबाचें ॠण फेडी हृषीकेशी । आंबॠषीचे सोशी गर्भवास ॥9॥ मिराबाइऩ साटीं घेतो विषप्याला । दामाजीचा जाला पाडेवार ॥10॥ घडी माती वाहे गो†या कुंभाराची। हुंडी महत्याची अंगें भरी ॥11॥ पुंडलिकासाटीं अझूनि तिष्ठत । तुका ह्मणे मात धन्य याची ॥12॥ 2811 भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥1॥ पूणिऩमेचा चंद्र चकोराचें जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥ दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥2॥ भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥3॥ तुका ह्मणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥4॥ 2812 आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥1॥ वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटइऩल ॥ध्रु.॥ अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघें चि मंगळ संतभेटी ॥2॥ तुका ह्मणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥3॥ 2813 करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥1॥ रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥ नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचिये वाणी गुण वदे ॥2॥ मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य ॥3॥ उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढ ॥4॥ तुका ह्मणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुह्मां भिन्न नाहीं माझा ॥5॥ 2814 कां रे माझीं पोरें ह्मणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥1॥ कां रे गेलें ह्मणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ मेलियाचा ॥ध्रु.॥ कां रे माझें माझें ह्मणसील गोत । नो संडविती दूत यमा हातीं ॥2॥ कां रे मी बिळया ह्मणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥3॥ तुका ह्मणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाइप पांडुरंगा ॥4 ॥ 2815 अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥1॥ ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥ मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥2॥ उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥3॥ उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥4॥ तुका ह्मणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥5॥ 2816 न मनीं ते Yाानी न मनीं ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावें ॥1॥ धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं ॥ध्रु.॥ न मनीं ते योगी न मनीं ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥2॥ तुका ह्मणे तयां नमन बाहएात्कारी । आवडती परी चित्तशुद्धीचे ॥3॥ 2817 कासिया पाषाण पूजिती पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥1॥ भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥ काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥2॥ काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥3॥ काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुिद्ध ते ॥4॥ तुका ह्मणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥5॥ 2818 अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥1॥ संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥ उचिताच्या कळा । नाहीं कळती सकळा ॥2॥ तुका ह्मणे अभावना । भावीं मूळ तें पतना॥3॥ 2819 शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥1॥ होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥ देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥2॥ तुका ह्मणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥3॥ 2820 कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुह्मी देवा संतजन ॥1॥ विचित्र विंदानी नानाकळा खेळ । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥ काय वानरांची अंगींची ते शिH । उदका तरती वरी शिळा ॥2॥ तुका ह्मणे करी निमित्य चि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥3॥ 2821 पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥1॥ तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥ काय उणें तुह्मां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥2॥ तुका ह्मणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं॥3॥ 2822 वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्प संतां समर्पीशी ॥1॥ सर्वसंकटाचा तुह्मां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ एकसरें चिंता ठेवूनियां पायीं । जालों उतराइऩ होतों तेणें ॥2॥ तुका ह्मणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥3॥ 2823 नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया॥1॥ कृपेचा वोरस न समाये पोटीं । ह्मणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥ तुमची उष्टावळी हें माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥2॥ परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥3॥ तुका ह्मणे राहे आठवण चित्तीं । ऐशी कृपा संतीं केली तुह्मीं ॥4॥ 1824 काय नाहीं माता गौरवीत बाळा । काय नाहीं लळा पाळीत ते ॥1॥ काय नाहीं त्याची करीत ते सेवा । काय नाहीं जीवा गोमटें तें ॥ध्रु.॥ अमंगळपणें कांटाळा न धरी । उचलोनि करीं कंठीं लावी ॥2॥ लेववी आपुले अंगें अळंकार । संतोषाये फार देखोनियां ॥3॥ तुका ह्मणे स्तुति योग्य नाहीं परी । तुह्मां लाज थोरी अंकिताची ॥4॥ 2825 माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें । पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥1॥ काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख । नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥ध्रु.॥ काया वाचा मनें अघटित करणें चर्मचक्षु हात पाय । निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥2॥ लIमीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद । पितृवचन घडली अवYाा अविचार। कुटिल कचर वादी निंद्य ॥3॥ आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन । भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट हीन ॥4॥ संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचारें वृिद्ध पापा । तुका ह्मणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥5॥ 2826 फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥1॥ जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥ तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥2॥ गोकुळासी आलें । ब्रह्म अव्यH चांगलें ॥3॥ नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥4॥ निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥5॥ आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥6॥ तुका ह्मणे कंसा । आट भोविला वळसा ॥7॥ 2827 सोडियेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥1॥ करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥ उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥2॥ तुका तेथें वारी ॥एकी आडोनि दुसरी ॥3॥ 2828 मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥1॥ केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥ न धरिती मनीं। कांहीं संकोच दाटणी ॥2॥ तुका ह्मणें देवें । ओस केल्या देहभावें ॥3॥ 2829 गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥1॥ बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥ गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥2॥ तुका ह्मणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥3॥ 2830 विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥1॥ खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥ तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥2॥ तुका ह्मणे देवें । पूतना शोषियेली जीवें॥3॥ ॥5॥ 2831 प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें। शुद्धी देशकाळाची ॥1॥ मुH लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभH। जाले वोसंडत । नामकीतिऩपवाडे ॥ध्रु.॥ जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरिसे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥2॥ हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका ह्मणे पाप । गांवीं नाहीं हरिजना ॥3॥ 2832 तो चि लटिक्यामाजी भला । ह्मणे देव म्यां देखिला॥1॥ ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे । बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥ आणिक नाहीं जोडा । देव ह्मणवितां या मूढा ॥2॥ आणिकांचे न मनी साचें । तुका ह्मणे या श्रेष्ठांचें ॥3॥ 2833 होइऩल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥1॥ येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥ धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥3॥ 2834 कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥1॥ ह्मणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥ कथे कांहीं अणुमात्र। नो बोलावें हा वृत्तांत । देवभHां चित्त । समरसीं खंडणा ॥2॥ कां वैष्णवा पूजावें । ऐका घेइऩल जो भावें । चरणरजा शिवें । वोडविला मस्तक ॥3॥ ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥4॥ घालोनि लोळणा। तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥5॥ 2835 अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें ॥1॥ नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥ उतरूनि दिलें कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥2॥ तुका ह्मणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥3॥ 2836 साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥1॥ लोलुपता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परमित ॥ध्रु.॥ एकांतीीं लोकांतीं िस्त्रयांशीं वचन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥2॥ संग सज्जनाचा उच्चार नामाचा । घोष कीर्तनाचा अहनिऩशीं ॥3॥ तुका ह्मणे ऐसा साधनीं जो राहे । तो चि Yाान लाहे गुरुकृपा ॥4॥ 2837 अंतरींची ज्योती प्रकाशली दीिप्त । मुळींची जे होती आच्छादिली ॥1॥ तेथींचा आनंद ब्रह्मांडीं न माये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥ भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥2॥ तुरा ह्मणे आह्मां ब्रह्मांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥3॥ 2838 कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥1॥ कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥ नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निमिऩयेलें ॥2॥ तुका ह्मणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥3॥ 2839 प्रारब्धें चि जोडे धन । प्रारब्धें चि वाडे मान ॥1॥ सोस करिसी वांयां । भज मना पंढरीराया ॥ध्रु.॥ प्रारब्धें चि होय सुख। प्रारब्धें चि पावे दुःख ॥2॥ प्रारब्धें चि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥3॥ 2840 हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥1॥ अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥ मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥2॥ राख राख गेलों वांयां । तुका ह्मणे पंढरीराया ॥3॥ 2841 तपाचे सायास । न लगे घेणें वनवास ॥1॥ ऐसें कळलें आह्मां एक । जालों नामाचे धारक ॥ध्रु.॥ जाळीं महाकर्में । दावीं निजसुख धर्में ॥2॥ तुका ह्मणे येणें । किळकाळ तें ठेंगणें॥3॥ 2842 माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥1॥ हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥ नागवी धावणें । तेथें साहए व्हावें कोणें ॥2॥ राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण वारी ॥3॥ तुझ्या केल्याविण । नव्हे िस्थर वश जन ॥4॥ तुका ह्मणे हरी। सूत्र तुह्मां हातीं दोरी॥5॥ 2843 गाऊं नेणें परी मी कांहीं गाइऩन । शरण जाइऩन पांडुरंगा ॥1॥ ब्रह्मांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥ वश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं ॥2॥ चरणींच्या रजें अहिल्या तारिली। रूपवंत केली कुबजा क्षणें ॥3॥ पृथिवी तारिली पाताळासी जातां। तुका ह्मणे आतां आह्मी किती ॥4॥ 2844 गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥1॥ काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥ अल्प असे Yाान । अंगीं ताठा अभिमान ॥2॥ तुका ह्मणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड॥3॥ 2845 परद्रव्य परनारी । अभिळासूनि नाक धरी ॥1॥ जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥ सोहोऑयाची िस्थती । क्रोधें विटाळला चित्तीं ॥2॥ तुका ह्मणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥3॥ 2846 टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥1॥ अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥ मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥2॥ तुका ह्मणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥3॥ 2847 ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥1॥ स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥ भांगभुकाऩ हें साधन। पची पडे मद्यपान ॥2॥ तुका ह्मणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥3॥ 2848 जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी ॥1॥ आपघर ना बापघर । चित्तीं मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥ सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥2॥ तुका ह्मणे असील जाती । जातीसाठीं खाती माती ॥3॥ 2849 अंधऑयाची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥1॥ हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥ साकर ह्मणोनि माती । चाळवूनि द्यावी हातीं ॥2॥ तुका ह्मणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥3॥ 2850 प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेइऩ ॥1॥ तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥ वेडे वांकडे बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥2॥ तुका ह्मणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥3॥ 2851 माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥1॥ आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥ वाचा वदे परी करणें कठीण । इंिद्रयां अधीन जालों देवा ॥2॥ तुका ह्मणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥3॥ 2852 वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥1॥ उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥ त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वणिऩताती ॥2॥ अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥3॥ तुका ह्मणे तुझी विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥4॥ 2853 नको देऊं देवा पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥1॥ नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥2॥ तुका ह्मणे करीं फकिराचे परी । रात्रदिवस हरि येइल घरा ॥3॥ 2854 जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥1॥ उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥ परउपकारी नेणें परनिंदा । परिस्त्रया सदा बहिणी माया ॥2॥ भूतदया गाइऩपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥3॥ शांतिरूपें नव्हे कोणाचा वाइऩट । वाढवी महkव वडिलांचें ॥4॥ तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥5॥ 2855 हरि ह्मणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरि ह्मणतां ॥1॥ हरि ह्मणतां भुिH हरि ह्मणतां मुिH । चुके यातायाती हरि ह्मणतां ॥ध्रु.॥ तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरि ह्मणतां ॥2॥ तुका ह्मणे भावें जपा हरिचें नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥3॥ 2856 नये वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥1॥ पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावे दिवसराती ॥ध्रु.॥ नये काकुळती । कोणा यावें हरिभिH ॥2॥ तुका ह्मणे साइऩ । करील कृपेची विठाइऩ॥3॥ 2857 सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥1॥ रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥ रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥2॥ तुका लुटितां हे रंग । साहए जाला पांडुरंग ॥3॥ 2858 उशीर कां केला । कृपाळुवा विठ्ठला ॥1॥ मज दिलें कोणा हातीं । काय मानिली नििंश्चती ॥ध्रु.॥ कोठवरी धरूं धीर । आतां मन करूं िस्थर ॥2॥ तुका ह्मणे जीव । ऐसी भाकितसे कींव ॥3॥ 2859 तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥1॥ नित्य वाचे हा चि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥ध्रु.॥ धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥2॥ गुरुYाान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥3॥ बोल नाइऩके कोणाचे । कथे नागवा चि नाचे॥4॥ संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥5॥ कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल ह्मणे ॥6॥ केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥7॥ अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥8॥ 2860 आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥1॥ अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरि बोडी डोइऩ दाढी ॥ध्रु.॥ बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥2॥ पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥3॥ भिHभावें विण । तुका ह्मणे अवघा सीण ॥4॥ 2861 तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥1॥ तुज नाचऊनि दाखवूं कौतुका । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥ तुजलागीं आह्मी गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥2॥ तुजलागीं आह्मीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कतृऩत्वासी ॥3॥ तुका ह्मणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥4॥ 2862 पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥1॥ करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥ जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥2॥ तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥3॥ 2863 दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥1॥ ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥ आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥2॥ लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥3॥ तुका ह्मणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥4॥ 2864 लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥1॥ विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वगाअ नाहीं ॥ध्रु.॥ कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥2॥ सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरिनामें ॥3॥ तुका ह्मणे नामापाशीं चारी मुिH । ऐसें बहुग्रंथीं बोलियेलें ॥4॥ 2865 लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें॥1॥ लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥ लटिकें गायें लटिकें ध्यायें । लटिकें जायें लटिक्यापें ॥3॥ लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥3॥ लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥4॥ 2866. जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥1॥ शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥ तापलिया तेली बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥2॥ पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥3॥ तुका ह्मणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥4॥ 2867 हे चि थोर भिH आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥1॥ ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥ वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥2॥ तुका ह्मणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥3॥ 2868 जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥1॥ मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥ ठाउका चि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥2॥ तुका ह्मणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥3॥ 2869 आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥1॥ मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥2॥ तुका ह्मणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥3॥ 2870 काय माझें नेती वाइऩट ह्मणोन । करूं समाधान कशासाटीं ॥1॥ काय मज लोक नेती परलोका । जातां कोणा एका निवारेल ॥ध्रु.॥ न ह्मणें कोणासी उत्तम वाइऩट । सुखें माझी कूट खावो मागें ॥2॥ सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥3॥ तुका ह्मणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥4॥ देवांनीं स्वामींस चिंचवडास नेलें होतें ते अभंग, आरत्या ॥ 13 ॥ 2871 वांजा गाइऩ दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥1॥ ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥ चातक पाखरूं। त्यासी वर्षे मेघधारु ॥ ॥ पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥3॥ तुका ह्मणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥4॥ 2872. परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥1॥ न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥ पडिलिये ठायीं उिच्छष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी आह्मां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥3॥ 2873 चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥1॥ देव ह्मणती तुक्या एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥ वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥2॥ तुका ह्मणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥3॥ 2874 भोHा नारायण लक्षुमीचा पति । ह्मणोनि प्राणाहुती घेतलिया ॥1॥ भर्ता आणि भोHा कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥ विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥2॥ कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भHांचें तुका ह्मणे ॥3॥ 2875 माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥1॥ तीथॉ तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥3॥ 2876 वंदिलें वंदावें जीवाचिये साटीं । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥1॥ स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघें चि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥ सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया वरी कोंभ नये ॥2॥ तुका ह्मणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥3॥ 2877 आह्मां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥1॥ वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥2॥ तुका ह्मणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥3॥ 2878 सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥1॥ संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥ समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची॥2॥ तुका ह्मणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥3॥ 2879 काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥1॥ ह्मणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें॥ध्रु.॥ काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥2॥ कोण लोकीं सांगा घातला बाहेरी । ह्मणतां हरि हरि तुका ह्मणे॥3॥ 2880 उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥1॥ नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥ उमटती ठसे । ब्रह्मप्रािप्त अंगीं दिसे ॥2॥ भाविक विश्वासी।तुका ह्मणे नमन त्यांसी॥3॥ ॥10॥ 2881 ज्यासी नावडे एकादशी । तो जिता चि नरकवासी॥1॥ ज्यासी नावडे हें व्रत । त्यासी नरक तो ही भीत ॥ध्रु.॥ ज्यासी मान्य एकादशी । तो जिता चि मुHवासी ॥2॥ ज्यासी घडे एकादशी । जाणें लागे विष्णुपाशीं ॥3॥ तुका ह्मणे पुण्यराशी । तो चि करी एकादशी ॥4॥ 2882 मुंगी होउनि साकर खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी॥1॥ वाळवंटी साकर पडे । गज येउनि काय रडे ॥ध्रु.॥ जाला हरिदास गोसांवी । अवघी मायिक क्रिया दावी ॥2॥ पाठ पाठांतरिक विद्या । जनरंजवणी संध्या ॥3॥ प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं ॥4॥ ब्रह्मYाान वाचे बोले । करणी पाहातां न निवती डोळे ॥5॥ मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती ॥6॥ तुका ह्मणे धाकुटें व्हावें । निजवस्तूसी मागुनि घ्यावें ॥7॥ 2883 भय हरिजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥1॥ नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥ चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥2॥ तुका ह्मणे मन । असों द्यावें समाधान॥3॥ 2884 आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥1॥ नेइऩल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुिश्चता हरिविण ॥ध्रु.॥ कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥2॥ राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥3॥ तुका ह्मणे किती करिसी लंडायी । होइऩल भंडाइऩ पुढें थोर ॥4॥ 2885 होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥1॥ हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोइऩ ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥ आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥2॥ तुका ह्मणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥3॥ 2886 नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण॥1॥ फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥ मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें माततसे ॥2॥ बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥3॥ बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥4॥ तुका ह्मणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥5॥ 2887 संत गाती हरिकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥1॥ हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥ काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥2॥ संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥3॥ तुका ह्मणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥4॥ 2888 जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥1॥ आतां वाणी काशासाटीं । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥ आपुल्या संकोचें । ह्मणऊनि तेथें टांचे ॥2॥ घेतों ख†या मापें । तुका देखोनियां सोपें ॥3॥ 2889 शुद्ध ऐसें ब्रह्मYाान । करा मन सादर ॥1॥ रवि रसां सकळां शोषी । गुणदोषीं न लिंपे ॥ध्रु.॥ कोणासवें नाहीं चोरी । सकळांवरी समत्व ॥2॥ सत्य तरी ऐसें आहे । तुका पाहे उपदेशीं॥3॥ 2890 अिग्न हा पाचारी कोणासी साक्षेपें । हिंवें तो चि तापे जाणोनियां ॥1॥ उदक ह्मणे काय या हो मज प्यावें । तृषित तो धांवे सेवावया ॥ध्रु.॥ काय वस्त्र ह्मणे यावो मज नेसा । आपुले स्वइच्छा जग वोढी ॥2॥ तुक्यास्वामी ह्मणे काय मज स्मरा । आपुल्या उद्धारा लागूनियां ॥3॥ 2891 भH देवाघरचा सुना । देव भHाचा पोसणा ॥1॥ येर येरां जडलें कैसें । जीवा अंगें जैसें तैसें ॥ध्रु.॥ देव भHाची कृपाळु माता । भH देवाचा जनिता ॥2॥ तुका ह्मणे अंगें । एक एकाचिया संगें ॥3॥ 2892 बरवयांबरवंट । विटे चरण सम नीट ॥1॥ ते म्या हृदयीं धरिले । तापशमन पाउलें ॥ध्रु.॥ सकळां तीर्थां अधिष्ठान । करी लक्षुमी संवाहन ॥2॥ तुका ह्मणे अंतीं । ठाव मागितला संतीं॥3॥ 2893 मासं चर्म हाडें । देवा अवघीं च गोडें ॥1॥ जे जे हरिरंगीं रंगले । कांहीं न वचे वांयां गेले ॥ध्रु.॥ वेद खाय शंखासुर। त्याचें वागवी कलिवर ॥2॥ तुका ह्मणे ऐसा । बराडी हा भिHरसा॥3॥ 2894 कोणा चिंता आड । कोणा लोकलाज नाड ॥1॥ कैंचा राम अभागिया । करी कटकट वांयां ॥ध्रु.॥ स्मरणाचा राग । क्रोधें विटाळलें अंग ॥2॥ तुका ह्मणे जडा । काय चाले या दगडा॥3॥ 2895 आपुलिया काजा । आह्मीं सांडियेलें लाजा ॥1॥ तुह्मां असों जागवीत । आपुलें आपुले हित ॥ध्रु.॥ तुह्मी देहशून्य। आह्मां कळे पाप पुण्य ॥2॥ सांगायासी लोकां । उरउरीत उरला तुका ॥3॥ 2896 मायबापें केवळ काशी । तेणें न वजावें तीर्थासी॥1॥ पुंडलीकें काय केलें । परब्रह्म उभें ठेलें ॥ध्रु.॥ तैसा होइप सावधान। हृदयीं धरीं नारायण ॥2॥ तुका ह्मणे मायबापें । अवघीं देवाचीं स्वरूपें ॥3॥ 2897 सत्य आह्मां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥1॥ ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥ देतों तीIण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥2॥ तुका ह्मणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें॥3॥ 2898 शिकवूनि हित । सोयी लावावे हे नीत ॥1॥ त्याग करूं नये खरें । ऐसें विचारावें बरें ॥ध्रु.॥ तुमचिया तोंडें । धर्माधर्म चि खंडे ॥2॥ मजसाटीं देवा । कां हो लपविला हेवा ॥3॥ जाला सावधान । त्यासी घालावें भोजन ॥4॥ तुका ह्मणे पिता । वरी बाळाच्या तो हिता ॥5॥ 2899 सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥1॥ रविरिश्मकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥ दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥2॥ तुका ह्मणे चित्त । माझें पायीं अखंडित॥3॥ 2900 तुह्मां न पडे वेच । माझा सरेल संकोच ॥1॥ फुकासाटीं जोडे यश । येथें कां करा आळस ॥ध्रु.॥ कृपेचें भुकेलें। होय जीवदान केलें ॥2॥ तुका ह्मणे शिकविलें । माझें ऐकावें विठ्ठलें॥3॥ 2901 लोक ह्मणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥1॥ आतां कळेल तें करीं । सीस तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥ अधिकार नाहीं। पूजा करिती तैसा कांहीं ॥2॥ मन जाणे पापा । तुका ह्मणे मायबापा॥3॥ 2902 एका ह्मणे भलें । आणिका सहज चि निंदिलें ॥1॥ कांहीं न करितां आयास । सहज घडले ते दोष ॥ध्रु.॥ बरें वाइटाचें। नाहीं मज कांहीं साचें ॥2॥ तुका ह्मणे वाणी । खंडोनि राहावें चिंतनीं॥3॥ 2903 आणिलें सेवटा । आतां कामा नये फांटा ॥1॥ मज आपुलेंसें ह्मणा । उपरि या नारायणा ॥ध्रु.॥ वेचियेली वाणी । युHी अवघी चरणीं ॥2॥ तुका धरी पाय । क्षमा करवूनि अन्याय॥3॥ 2904 न करा टांचणी । येथें कांहीं आडचणी ॥1॥ जिव्हा अमुप करी माप । विठ्ठल पिकला माझा बाप ॥2॥ तुका ह्मणे सर्वकाळ । अवघा गोविंद गोपाळ ॥3॥ 2905 तुझ्या नामाची आवडी । आह्मी विठो तुझीं वेडीं॥1॥ आतां न वजों अणिकां ठायां । गाऊं गीत लागों पायां ॥ध्रु.॥ काय वैकुंठ बापुडें । तुझ्या प्रेमासुखापुढें ॥2॥ संतसमागममेळे । प्रेमसुखाचा सुकाळ ॥3॥ तुका ह्मणे तुझ्या पायीं । जन्ममरणा ठाव नाहीं ॥4॥ 2906 साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥1॥ तैसें आह्मां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥ फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥2॥ रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥3॥ देवा देवपाट देव्हा†यावरी बैसे स्पष्ट॥4॥ ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता सज्जन लोकां ॥5॥ 2907 धनवंतालागीं । सर्वमान्यता आहे जगीं ॥1॥ माता पिता बंधु जन । सर्व मानिती वचन ॥ध्रु.॥ जव मोठा चाले धंदा । तंव बहिण म्हणे दादा ॥2॥ सदा शृंगारभूषणें । कांता लवे बहुमानें॥3॥ तुका ह्मणे धन । भाग्य अशाश्वत जाण ॥4॥ 2908 न विचारितां ठायाठाव । काय भुंके तो गाढव ॥1॥ केला तैसा लाहे दंड । खळ अविचारी लंड ॥ध्रु.॥ करावें लाताळें। ऐसें नेणे कोण्या काळें ॥2॥ न कळे उचित । तुका ह्मणे नीत हित॥3॥ 2909 कंठ नामसिका । आतां किळकाळासी धका ॥1॥ रोखा माना कीं सिका माना । रोखा सिका तत्समाना ॥ध्रु.॥ रोखा न मना सिका न मना । जतन करा नाककाना ॥2॥ सिका न मनी रावण । त्याचें केलें निसंतान ॥3॥ सिका मानी हळाहळ । जालें सर्वांगीं शीतळ ॥4॥ तुका ह्मणे नाम सिका । पटीं बैसलों निजसुखा॥5॥ 2910 भूतीं देव ह्मणोनि भेटतों या जना । नाहीं हे भावना नरनारी ॥1॥ जाणे भाव पांडुरंग अंतरींचा । नलगे द्यावा साचा परिहार ॥ध्रु.॥ दयेसाटीं केला उपाधिपसारा । जड जीवा तारा नाव कथा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं पडत उपवास । फिरतसे आस धरोनियां॥3॥ 2911 हारपल्याची नका चित्तीं । धरूं खंती वांयां च ॥1॥ पावलें तें ह्मणा देवा । सहज सेवा या नांवें ॥ध्रु.॥ होणार तें तें भोगें घडे । लाभ जोडे संकल्पें ॥2॥ तुका ह्मणे मोकळें मन । अवघें पुण्य या नांवें ॥3॥ 2912 नेसणें आलें होतें गऑया । लोक रऑया करिती॥1॥ आपणियां सावरिलें । जग भलें आपण ॥ध्रु.॥ संबंध तो तुटला येणें । जागेपणें चेष्टाचा ॥2॥ भलती सेवा होती अंगें । बारस वेगें पडिलें ॥3॥ सावरिलें नीट वोजा । दृिष्टलाजा पुढिलांच्या ॥4॥ बरे उघडिले डोळे । हळहळेपासूनि ॥5॥ तुका ह्मणे विटंबना । नारायणा चुकली ॥6॥ 2913 जिव्हा जाणे फिकें मधुर क्षार । येर मास पर हातास न कळे ॥1॥ देखावें नेत्रीं बोलावें मुखें । चित्ता सुखदुःखें कळों येती ॥ध्रु.॥ परिमळासी घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नव्हे ॥2॥ एकदेहीं भिन्न ठेवियेल्या कळा । नाचवी पुतळा सूत्रधारी॥3॥ तुका ह्मणे ऐशी जयाची सत्ता । कां तया अनंता विसरलेती ॥4॥ 2914 न लगे द्यावा जीव सहज चि जाणार । आहे तो विचार जाणा कांहीं ॥1॥ मरण जो मागे गाढवाचा बाळ । बोलिजे चांडाळ शुद्ध त्यासी ॥2॥ तुका ह्मणे कइप होइऩल स्वहित । निधान जो थीत टाकुं पाहे ॥3॥ 2915 मोल वेचूनियां धुंडिती सेवका । आह्मी तरी फुका मागों बळें ॥1॥ नसतां जवळी हित फार करूं । जीव भाव धरूं तुझ्या पायीं ॥ध्रु.॥ नेदूं भोग आह्मी आपुल्या शरीरा । तुह्मांसी दातारा व्हावें म्हूण ॥2॥ कीर्ती तुझी करूं आमुचे सायास । तूं का रे उदास पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे तुज काय मागों आह्मी । फुकाचे कां ना भी ह्मणसी ना ॥4॥ 2916 काय लवण किळकेविण । एके क्षीण सागरा ॥1॥ मां हे येवढी अडचण । नारायणीं मजविण ॥ध्रु.॥ कुबेरा अटाहासे जोडी । काय कवडी कारणें ॥2॥ तुका ह्मणे काचमणि । कोण गणी भांडारी ॥3॥ 2917 तुज मज नाहीं भेद । केला सहज विनोद ॥1॥ तूं माझा आकार । मी तों तूं च निर्धार ॥ध्रु.॥ मी तुजमाजी देवा । घेसी माझ्या अंगें सेवा ॥2॥ मी तुजमाजी अचळ । मजमाजी तुझें बळ॥3॥ तूं बोलसी माझ्या मुखें । मी तों तुजमाजी सुखें ॥4॥ तुका ह्मणे देवा । विपरीत ठायीं नांवा ॥5॥ 2918 वैराग्याचें भाग्य । संतसंग हा चि लाग ॥1॥ संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥ तो चि देवभH । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥2॥ तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाये ॥3॥ 2919 जप तप ध्यान न लगे धारणा । विठ्ठलकीर्त्तनामाजी सर्व ॥1॥ राहें माझ्या मना दृढ या वचनीं । आणिक तें मनीं न धरावें ॥ध्रु.॥ कीर्तनसमाधि साधन ते मुद्रा । राहतील थारा धरोनियां॥2॥ तुका ह्मणे मुिH हरिदासांच्या घरीं । वोळगती चारी ॠिद्धसििद्ध ॥3॥ 2920 नाहीं तुज कांहीं मागत संपत्ती । आठवण चित्तीं असों द्यावी ॥1॥ सरलिया भोग येइऩन सेवटीं । पायापें या भेटी अनुसंधानें ॥ध्रु.॥ आतां मजसाटीं याल आकारास । रोकडी हे आस नाहीं देवा ॥2॥ तुका ह्मणे मुखीं असो तुझें नाम । देइऩल तो श्रम देवो काळ ॥3॥ 2921 हितावरी यावें । कोणी बोलिलों या भावें ॥1॥ नव्हे विनोदउत्तर । केले रंजवाया चार ॥ध्रु.॥ केली अटाअटी । अक्षरांची देवासाटीं ॥2॥ तुका ह्मणे खिजों । नका जागा येथें निजों ॥3॥ 2922 संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण॥1॥ नाहीं आह्मांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥ द्वैताद्वैतभावें। अवघें व्यापियेलें देवें ॥2॥ तुका ह्मणे हरि । आह्मांमाजी क्रीडा करी ॥3॥ 2923 नेणे करूं सेवा । पांडुरंगा कृपाळुवा ॥1॥ धांवें बुडतों मी काढीं । सत्ता आपुलिया ओढीं ॥ध्रु.॥ क्रियाकर्महीन । जालों इंिद्रयां अधीन ॥2॥ तुका विनंती करी । वेळोवेळां पाय धरी॥3॥ 2924 जयापासोनि सकळ । महीमंडळ जालें ॥1॥ तो एक पंढरीचा राणा । नये श्रुती अनुमाना ॥ध्रु.॥ विवादती जयासाठीं। जगजेटी तो विठ्ठल ॥2॥ तुका ह्मणे तो आकळ । आहे सकळव्यापक॥3॥ 2925 नाहीं रूप नाहीं नांव । नाहीं ठाव धराया ॥1॥ जेथें जावें तेथें आहे । विठ्ठल मायबहीण ॥ध्रु.॥ नाहीं आकार विकार । चराचर भरलेंसे ॥2॥ नव्हे निर्गुण सगुण । जाणे कोण तयासी॥3॥ तुका ह्मणे भावाविण । त्याचें मन वोळेना ॥4॥ 2926 आहे सकळां वेगळा । खेळे कळा चोरोनि ॥1॥ खांबसुत्राचिये परी । देव दोरी हालवितो ॥ध्रु.॥ आपण राहोनि निराळा । कैसी कळा नाचवी ॥2॥ जेव्हां असुडितो दोरी । भूमीवरी पडे तेव्हां ॥3॥ तुका ह्मणे तो जाणावा । सखा करावा आपुला ॥4॥ 2927 आतां पुढें मना । चाली जाली नारायणा ॥1॥ येथें राहिलें राहिलें । कैसें गुंतोनि उगलें ॥ध्रु.॥ भोवतें भोंवनी । आलियांची जाली धणी ॥2॥ तुका ह्मणे रंग रंग । रंगलें पांडुरंगे ॥3॥ 2928 आळस पाडी विषयकामीं । शHी देइप तुझ्या नामीं॥1॥ हे चि विनवणी विनवणी । विनविली धरा मनीं ॥ध्रु.॥ आणिक वचना मुकी वाणी । तुमच्या गजाॉ द्यावी गुणीं ॥2॥ तुका ह्मणे पाय डोळां । पाहें एरवी अंधळा ॥3॥ 2929 कोण वेची वाणी । आतां क्षुल्लका कारणीं ॥1॥ आतां हें चि काम करूं । विठ्ठल हृदयांत धरूं ॥ध्रु.॥ नेंदाविया वृित्त। आतां उठों चि बहुती ॥2॥ उपदेश लोकां । करूनी वेडा होतो तुका ॥3॥ 2930 मागेन तें एक तुज । देइप विचारोनि मज ॥1॥ नको दुर्जनांचा संग । क्षणक्षणा चित्तभंग ॥ध्रु.॥ जन्म घेइऩन मी नाना । बहु सोसीन यातना ॥2॥ रंक होइऩन दीनांचा । घायें देहपात साचा॥3॥ तुका ह्मणे हें चि आतां । देइप देइप तूं सर्वथा ॥4॥ 2931 जाणसी उचित । पांडुरंगा धर्मनीत ॥1॥ तरि म्यां बोलावें तें काइऩ । सरे ऐसें तुझे पायीं ॥ध्रु.॥ पालटती क्षणें । संचितप्रारब्धक्रियमाण ॥2॥ तुका ह्मणे सत्ता । होसी सकळ करिता॥3॥ 2932 तुह्मी कांटाळलां तरी । आह्मां न सोडणें हरी ॥1॥ जावें कवणिया ठाया । सांगा विनवितों पायां ॥ध्रु.॥ केली जिवा साटी । आतां सुखें लागा पाठी ॥2॥ तुका ह्मणे ठाव । न सोडणें हा चि भाव ॥3॥ 2933 येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥1॥ नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभस्वार्थ। अवघा माझा पंढरिनाथ ॥2॥ तुका ह्मणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥3॥ 2934 सर्वपक्षीं हरि साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥1॥ सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥2॥ तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥3॥ 2935 काय पुण्य ऐसें आहे मजपाशीं । तांतडी धांवसी पांडुरंगा ॥1॥ काय ऐसा भH वांयां गेलों थोर । तूं मज समोर होसी वेगा ॥ध्रु.॥ काय कष्ट माझे देखिली चाकरी । तो तूं झडकरी पाचारिशी ॥2॥ कोण मी नांवाचा थोर गेलों मोटा । अपराधी करंटा नारायणा ॥3॥ तुका ह्मणे नाहीं ठाउकें संचित । येणें जन्महित नाहीं केलें ॥4॥ 2936 आमुचिया भावें तुज देवपण । तें कां विसरोन राहिलासी ॥1॥ समर्थासी नाहीं उपकारस्मरण । दिल्या आठवण वांचोनियां ॥ध्रु.॥ चळण वळण सेवकाच्या बळें । निर्गुणाच्यामुळें सांभाळावें ॥2॥ तुका ह्मणे आतां आलों खंडावरी । प्रेम देउनि हरी बुझवावें ॥3॥ 2937 आह्मी मेलों तेव्हां देह दिला देवा । आतां करूं सेवा कोणाची ॥1॥ सूत्रधारी जैसा हालवितो कळा । तैसा तो पुतळा नाचे छंदें ॥ध्रु.॥ बोलतसें जैसें बोलवितो देव । मज हा संदेह कासयाचा ॥2॥ पाप पुण्य ज्याचें तो चि जाणें कांहीं । संबंध हा नाहीं आह्मांसवें ॥3॥ तुका ह्मणे तुह्मी आइका हो मात । आह्मी या अतीत देहाहूनी ॥4॥ 2938 लागों नेदीं बोल पायां तुझ्या हरी । जीव जावो परि न करीं आण ॥1॥ परनारी मज रखुमाइऩसमान । वमनाहूनि धन नीच मानीं ॥2॥ तुका ह्मणे याची लाज असे कोणा । सहाकारी दीना ज्याची तया ॥3॥ 2939 हे चि भेटी साच रूपाचा आठव । विसावला जीव आवडीपें ॥1॥ सुखाचें भातुकें करावें जतन । सेविल्या ताहान भूक जाय ॥ध्रु.॥ दुरील जवळी आपण चि होतें । कविळलें चित्तें जिवापासीं ॥2॥ तुका ह्मणे नाम घेतों वेळोवेळां । होतील सकळा शीतळा नाडी ॥3॥ 2940 आपुलिया बळें नाहीं मी बोलत । सखा भगवंत वाचा त्याची ॥1॥ साळुंकी मंजूळ बोलतसे वाणी । शिकविता धणी वेगळाची ॥ध्रु.॥ काय म्यां पामरें बोलावीं उत्तरें । परि त्या विश्वंभरें बोलविलें ॥2॥ तुका ह्मणे त्याची कोण जाणे कळा । चालवी पांगळा पायांविण ॥3॥ 2941 हित सांगे तेणें दिलें जीवदान । घातकी तो जाण मनामागें ॥1॥ बळें हे वारावे अधर्म करितां । अंधळें चालतां आडरानें ॥ध्रु.॥ द्रव्य देऊनियां धाडावें तीर्थासी । नेदावें चोरासी चंद्रबळ ॥2॥ तुका ह्मणे ऐसें आहे हें पुराणीं । नाहीं माझी वाणी पदरींची ॥3॥ 2942 ऐसा घेइप कां रे संन्यास । करीं संकल्पाचा नास॥1॥ मग तूं राहें भलते ठायीं । जनीं वनीं खाटे भोइऩ ॥ध्रु.॥ तोडीं जाणिवेची कळा । होइप वृत्तीसी वेगळा ॥2॥ तुका ह्मणणे नभा । होइप आणुचा ही गाभा ॥3॥ 2943 सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापें ॥1॥ ऐसे तुह्मां ठायाठाव । देव ह्मुण संपादे ॥ध्रु.॥ कैची चिरामध्यें चिरे। मना बरें आलें तें ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । अंगलगा भिन्न करा॥3॥ 2944 इहलोकीं आह्मां भूषण अवकळा । भोपळा वाकळा आणि भिक्षा ॥1॥ निमोली संपदा भयविरहित । सर्वकाळ चित्त समाधान ॥ध्रु.॥ छिद्राचा आश्रम उंदीरकुळवाडी । धन नाम जोडी देवाचें तें ॥2॥ तुका ह्मणे एक सेवटीं राहाणें । वर्ततों या जना विरहित ॥3॥ 2945 आह्मी भाग्याचे भाग्याचे । आह्मां तांबे भोपऑयाचे॥1॥ लोकां घरीं गाइऩ ह्मैसी । आह्मां घरीं उंदीरघुसी ॥ध्रु.॥ लोकां घरीं हत्ती घोडे । आह्मां आधोडीचे जोडे ॥2॥ तुका ह्मणे आह्मी सुडके। आह्मां देखोन काळ धाके ॥3॥ 2946 गाऊं नेणें कळा कुसरी । कान धरोनि ह्मणें हरी॥1॥ माझ्या बोबडिया बोला । चित्त द्यावें बा विठ्ठला ॥ध्रु.॥ मज हंसतील लोक । परि मी गाइऩन निःशंक ॥2॥ तुझे नामीं मी निर्लज्ज । काय जनासवें काज ॥3॥ तुका ह्मणे माझी विनंती । तुह्मी परिसा कमळापती ॥4॥ 2947 विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥1॥ पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥ चंदन िप्रय वासें । आवडे तें जातीऐसें ॥2॥ तुका ह्मणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना॥3॥ 2948 देव अवघें प्रतिपादी । वंदी सकळां एक निंदी ॥1॥ तेथें अवघें गेलें वांयां । विष घास एके ठायां ॥ध्रु.॥ सर्वांग कुरवाळी । उपटी एकच रोमावळी ॥2॥ तुका ह्मणे चित्त । नाहीं जयाचें अंकित ॥3॥ 2949 मज माझा उपदेश । आणिकां नये याचा रीस ॥1॥ तुह्मी अवघे पांडुरंग । मी च दुष्ट सकळ चांग ॥ध्रु.॥ तुमचा मी शरणागत । कांहीं करा माझें हित ॥2॥ तुका पाय धरी । मी हें माझें दुर करीं ॥3॥ 2950 जाणे त्याचें वर्म नेणे त्याचें कर्म । केल्याविण धर्म नेणवती ॥2॥ मैथुनाचें सुख सांगितल्या शून्य । अनुभवाविण कळूं नये ॥2॥ तुका ह्मणे जळो शािब्दक हें Yाान । विठोबाची खूण विरळा जाणे ॥3॥ 2951 अभिमानी पांडुरंग । गोवा काशाचा हो मग ॥1॥ अनुसरा लवलाहीं । नका विचार करूं कांहीं ॥ध्रु.॥ कोठें राहतील पापें । जालिया हो अनुतापें ॥2॥ तुका ह्मणे ये चि घडी । उभ्या पाववील थडी ॥3॥ 2952 तुझें वर्म हातीं । दिलें सांगोनियां संतीं ॥1॥ मुखीं नाम धरीन कंठीं । अवघा सांटवीन पोटीं ॥ध्रु.॥ नवविधा वेढिन आधीं । सांपडलासी भावसंधी ॥2॥ तुका ह्मणे बिळये गाढे । किळकाळ पायां पडे ॥3॥ 2953 माझ्या मना लागो चाळा । पहावया विठ्ठला डोळां॥1॥ आणीक नाही चाड । न लगे संसार हा गोड ॥ध्रु.॥ तरि च फळ जन्मा आलों । सरता पांडुरंगीं जालों ॥2॥ तुका ह्मणे देवा । देइप चरणांची सेवा ॥3॥ 2954 अवघें जेणें पाप नासे । तें हें असे पंढरीसी ॥1॥ गात जागा गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥ध्रु.॥ अवघी सुखाची च राशी । पुंडलिकाशीं वोळली हे ॥2॥ तुका ह्मणे जवळी आलें। उभे ठालें समचरणीं ॥3॥ 2955 देह तुझ्या पायीं । ठेवूनि जालों उतराइऩ ॥1॥ आतां माझ्या जीवां । करणें तें करीं देवा ॥ध्रु.॥ बहु अपराधी । मतिमंद हीनबुिद्ध ॥2॥ तुका ह्मणे नेणें । भावभHीचीं लक्षणें ॥3॥ 2956 जन हें सुखाचें दिल्याघेतल्याचें । अंत हें काळींचें नाहीं कोणी ॥1॥ जाल्या हीन शिH नाकडोळे गळती । सांडोनि पळती रांडापोरें ॥ध्रु.॥ बाइल ह्मणे खर मरता तरी बरें । नासिलें हें घर थुंकोनियां ॥2॥ तुका ह्मणे माझीं नव्हतील कोणी । तुज चक्रपाणी वांचूनियां ॥3॥ 2957 जाणोनि नेणतें करीं माझें मन । तुझी प्रेमखूण देऊनियां ॥1॥ मग मी व्यवहारीं असेन वर्तत । जेवीं जळाआंत पद्मपत्र ॥ध्रु.॥ ऐकोनि नाइकें निंदास्तुति कानीं । जैसा कां उन्मनी योगिराज ॥2॥ देखोनि न देखें प्रपंच हा दृष्टी । स्वप्नऴिचया सृिष्ट चेविल्या जेवीं ॥2॥ तुका ह्मणे ऐसें जालियावांचून । करणें तें तें सीण वाटतसे ॥4॥ 2958 विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥1॥ कइप कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥2॥ तुका ह्मणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥3॥ 2959 ज्यासी विषयाचें ध्यान । त्यासी कैंचा नारायण॥1॥ साधु कैंचा पापीयासी । काय चांडाळासी काशी ॥ध्रु.॥ काय पतितासी पिता । काय अधमासी गीता ॥2॥ तुका ह्मणे निरंजनी। शट कैंचा ब्रह्मYाानी ॥3॥ 2960 वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥1॥ राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥ आशा धरोनि मनीं । कांहीं देइऩल ह्मणऊनि ॥2॥ पोटा एका साटीं । तुका ह्मणे जाले कष्टी ॥3॥ 2961 प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो ॥1॥ ऐसें करिं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥ पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता ॥2॥ लटिकें तें फेडा । तुका ह्मणे जाय पीडा॥3॥ 2962 ऐका कलीचें हें फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ ॥1॥ चारी वर्ण अठरा याती । भोजन करिती एके पंHी ॥ध्रु.॥ पूजितीअसुरा रांडा । मद्य प्राशितील पेंढा ॥2॥ वामकवळ मार्जन । जन जाइऩल अधोपतन ॥3॥ तुका हरिभिH करी । शिH पाणी वाहे घरीं॥4॥ 2963 गुरुमार्गामुळें भ्रष्ट सर्वकाळ । ह्मणती याती कुळ नाहीं ब्रह्मीं ॥1॥ पवित्राला ह्मणती नको हा कंटक । मानिती आित्मक अनामिका ॥ध्रु.॥ डोहोर होलार दासी बलुती बारा । उपदेशिती फारा रांडापोरा ॥2॥ कांहीं टाण्या टोण्या विप्र शिष्य होती । उघडी फजिती स्वधर्माची ॥3॥ नसता करुनी होम खाती एके ठायीं । ह्मणती पाप नाहीं मोक्ष येणें ॥4॥ इंिद्रयांचे पेठे भला कौल देती । मर्यादा जकाती माफ केली ॥5॥ नाहीं शास्त्राधार पात्रापात्र नेणे । उपदेशून घेणें द्रव्य कांहीं ॥6॥ तुका ह्मणे ऐसे गुरु शिष्य पूर्ण । विठोबाची आण नरका जाती ॥7॥ 2964 बोलाचे गौरव । नव्हे माझा हा अनुभव ॥1॥ माझी हरिकथा माउली । नव्हे आणिकांसी पांगिली ॥ध्रु.॥ व्याली वाढविलें। निजपदीं निजवलें ॥2॥ दाटली वो रसें । त्रिभुवन ब्रह्मरसें ॥3॥ विष्णु जोडी कर । माथां रज वंदी हर ॥4॥ तुका ह्मणे बळ । तोरडीं हा किळकाळ ॥5॥ 2965 सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥1॥ आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाइऩच्या वरा ॥ध्रु.॥ परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥2॥ तुका ह्मणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥3॥ 2966 तुझें नाम गाऊं आतां । तुझ्या रंगीं नाचों था था॥1॥ तुझ्या नामाचा विश्वास । आह्मां कैंचा गर्भवास ॥ध्रु.॥ तुझे नामीं विसर पडे । तरी कोटी हत्या घडे ॥2॥ नाम घ्या रे कोणी फुका। भावें सांगतसे तुका ॥3॥ 2967 बाइल तरी ऐसी व्हावी । नरकीं गोवी अनिवार॥1॥ घडों नेदी तीर्थयात्रा । केला कुतरा हातसोंका ॥ध्रु.॥ आपुली च करवी सेवा । पुजवी देवासारिखें ॥2॥ तुका ह्मणे गाढव पशु । केला नाशु आयुष्या ॥3॥ 2968 बाइले अधीन होय ज्याचें जिणें । तयाच्या अवलोकनें पडिजे द्वाड ॥1॥ कासया ते जंत जिताती संसारीं । माकडाच्या परी गारोडएांच्या ॥ध्रु.॥ वाइलेच्या मना येइऩल तें खरें । अभागी तें पुरें बाइलेचें ॥2॥ तुका ह्मणे मेंग्या गाढवाचें जिणें । कुत†याचें खाणें लगबगा ॥3॥ 2969 जगीं मान्य केलें हा तुझा देकार । कीं कांहीं विचार आहे पुढें ॥1॥ करितों कवित्व जोडितों अक्षरें । येणें काय पुरें जालें माझें ॥ध्रु.॥ तोंवरि हे माझी न सरे करकर । जो नव्हे विचार तुझ्या मुखें ॥2॥ तुका ह्मणे तुज पुंडलिकाची आण । जरी कांहीं वचन करिसी मज ॥3॥ 2970 कोंडिला गे माज । निरोधुनी द्वार । राखण तें बरें । येथें करा कारण ॥1॥ हा गे हा गे हरि । करितां सांपडला चोरी । घाला गांठी धरी । जीवें माय त्रासाया ॥ध्रु.॥ तें चि पुढें आड । तिचा लोभ तिला नाड । लावुनी चरफड । हात गोउनी पळावें॥2॥ संशयाचें बि†हडें । याचे निरसले भेटी । घेतली ते तुटी । आतां घेतां फावेल ॥3॥ तुका येतो काकुलती । वाउगिया सोड । यासी चि निवाड । आह्मी भार वाहिका ॥4॥ 2971 झड मारोनियां बैसलों पंगती । उठवितां फजिती दातयाची ॥1॥ काय तें उचित तुह्मां कां न कळे । कां हो झांका डोळे पांडुरंगा ॥ध्रु.॥ घेइऩन इच्छेचें मागोनि सकळ । नाहीं नव्हे काळ बोलायाचा ॥2॥ तुका ह्मणे जालों माना अधिकारी । नाहीं लोक परी लाज देवा ॥3॥ 2972 नाम न वदे ज्याची वाचा । तो लेंक दो बापांचा॥1॥ हे चि ओळख तयाची । खूण जाणा अभHाची ॥ध्रु.॥ ज्याची विठ्ठल नाहीं ठावा । त्याचा संग न करावा ॥2॥ नाम न म्हणे ज्याचें तोंड । तें चि चर्मकाचें कुंड ॥3॥ तुका ह्मणे त्याचे दिवशीं। रांड गेली महारापाशीं ॥4॥ 2973 पतित मी पापी शरण आलों तुज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥1॥ तारियेले भH न कळे तुझा अंत । थोर मी पतित पांडुरंगा ॥ध्रु.॥ द्रौपदी बहिणी वैरीं गांजियेली । आपणाऐसी केली पांडुरंगा ॥2॥ प्रल्हादाकारणें स्तंभीं अवतार । माझा कां विसर पांडुरंगा ॥3॥ सुदामा ब्राह्मण दारिद्रें पीडिला । आपणाऐसा केला पांडुरंगा ॥4॥ तुका ह्मणे तुज शरण निजभावें । पाप निदाऩळावें पांडुरंगा ॥5॥ 2974 कस्तूरीचें रूप अति हीनवर । माजी असे सार मोल तया ॥1॥ आणीक ही तैसीं चंदनाचीं झाडें । परिमळें वाढे मोल तयां ॥ध्रु.॥ काय रूपें असे परीस चांगला । धातु केली मोला वाढ तेणें ॥2॥ फिरंगी आटितां नये बारा रुके । गुणें मोलें विकें सहस्रवरी ॥ ।3॥ तुका ह्मणे नाहीं जातीसवें काम । ज्याचे मुखीं नाम तो चि धन्य ॥4॥ 2975 नव्हें मी स्वतंत्र अंगाचा पाइऩक । जे हे सकिळक सत्ता वारूं ॥1॥ तुह्मां आळवावें पाउला पाउलीं । कृपेची साउली करीं मज ॥ध्रु.॥ शिHहीन तरी जालों शरणागत । आपुला वृत्तांत जाणोनियां ॥2॥ तुका ह्मणे भवाभेणें धरिलें पाय । आणीक उपाय नेणें कांहीं ॥3॥ 2976 पाहों ग्रंथ तरी आयुष्य नाहीं हातीं । नाहीं ऐशी मति अर्थ कळे ॥1॥ होइऩल तें हो या विठोबाच्या नांवें । आचरलें भावें जीवीं धरूं ॥ध्रु.॥ एखादा अंगासी येइऩल प्रकार । विचारितां फार युिH वाढे ॥2॥ तुका ह्मणे आळी करितां गोमटी । मायबापा पोटीं येते दया ॥3॥ 2977 पाहातां रूप डोळां भरें । अंतर नुरे वेगळें । इच्छावशें खेळ मांडी । अवघें सांडी बाहेरी ॥1॥ तो हा नंदानंदन बाइये । यासी काय परिचार वो ॥ध्रु.॥ दिसतो हा नव्हे तैसा । असे दिशाव्यापक । लाघव हा खोळेसाटीं । होतां भेटी परतेना ॥2॥ ह्मणोनि उभी ठालीये । परतलीये या वाटा । आड करोनियां तुका। जो या लोकां दाखवितो ॥3॥ 2978 दुःखें दुभागलें हृदयसंपुष्ट । गहिंवरें कंठ दाटताहे॥1॥ ऐसें काय केलें सुमित्रा सखया । दिलें टाकोनियां वनामाजी ॥ध्रु.॥ आक्रंदती बाळें करुणावचनीं । त्या शोकें मेदिनी फुटों पाहे ॥2॥ काय हे सामर्थ्य नव्हतें तुजपाशीं । संगें न्यावयासी अंगभूतां ॥3॥ तुज ठावें आह्मां कोणी नाहीं सखा । उभयलोकीं तुका तुजविण॥4॥ कान्हा ह्मणे तुझ्या वियोगें पोरटीं । जालों दे रे भेटी बंधुराया ॥5॥ 2979 सख्यत्वासी गेलों करीत सलगी । नेणें चि अभागी महिमा तुझा ॥1॥ पावलों आपुलें केलें लाहें रास । निद।वां परिस काय होय ॥ध्रु.॥ कष्टविलासी म्यां चांडाळें संसारीं । अद्यापिवरि तरि उपदेशीं ॥2॥ उचित अनुचित सांभािळलें नाहीं । कान्हा ह्मणे कांहीं बोलों आतां ॥3॥ 2980 असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येइल येथें ॥1॥ करूं कांहीं दिस राहे तों सायास । झोंबों त्या लागास भावाचिये ॥ध्रु.॥ करितां रोदना बापुडें ह्मणती । परि नये अंतीं कामा कोणी ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे पडिलिया वनीं । विचार तो मनीं बोलिला हे ॥3॥ 2981 चरफडें चरफड शोकें शोक होये । कार्यमूळ आहे धीरापाशीं ॥1॥ कल्पतसे मज ऐसें हें पाहातां । करावी ते चिंता मिथ्या खोटी ॥ध्रु.॥ न चुके होणार सांडिल्या शूरत्वा । फुकट चि सkवा होइल हानी ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे दिल्या बंद मना । वांचूनि निधाना न पवीजे ॥3॥ 2982 न लगे चिंता आतां अन्मोन हाता । आलें मूळ भ्राता गेला त्याचें ॥1॥ घरभेद्या येथें आहे तें सुकानु । धरितों कवळून पाय दोन्ही ॥ध्रु.॥ त्याचें त्याचिया मुखें पडिलें ठावें । न लगे सारावें मागें पुढें ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे करील भेटी भावा । सोडीन तेधवां या विठ्ठला ॥3॥ 2983 मूळस्थळ ज्याचें गोमतीचे तीरीं । तो हा सारी दोरी खेळवितो ॥1॥ ऐसें हे कळलें असावें सकळां । चोर त्या वेगळा नाहीं दुजा ॥ध्रु.॥ वैष्णव हे रे तयाचे पाळती । खूण हे निरुती सांगितली ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे आलें अनुभवास । तेणें च आह्मांस नागविलें ॥3॥ 2984 बरा रे निर्गुणा नष्ट नारायणा । घरबुडवणा भेटलासी ॥1॥ एके घरीं कोणी कोणासी न धरी । ऐसी अपरांपरी केली आह्मां ॥2॥ कान्हा ह्मणे कां रे निःकाम देखिलें । ह्मणोनि मना आलें करितोसी ॥3॥ 2985 धिंदधिंद तुझ्या करीन धिंदडएा । ऐसें काय वेडएा जाणितलें ॥1॥ केली तरी बरें मज भेटी भावास । नाहीं तरि नास आरंभिला ॥ध्रु.॥ मरावें मारावें या आलें प्रसंगा । बरें पांडुरंगा कळलेंसावें ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे तुझी माझी उरी । उडाली न धरीं भीड कांहीं ॥3॥ 2986 भुिH मुिH तुझें जळों ब्रह्मYाान । दे माझ्या आणोनी भावा वेगीं ॥1॥ रिद्धी सिद्धी मोक्ष ठेवीं गुंडाळून । दे माझ्या आणून भावा वेगीं ॥ध्रु.॥ नको आपुलिया नेऊं वैकुंठासी । दे माझ्या भावासी आणुन वेगीं ॥2॥ नको होऊं कांहीं होसील प्रसन्न। दे माझ्या आणून भावा वेगीं ॥3॥ तुकयाबंधु ह्मणे पाहा हो नाहींतरी । हत्या होइऩल शिरीं पांडुरंगा ॥4॥ 2987 मुख्य आहे आह्मां मातेचा पटंगा । तुज पांडुरंगा कोण लेखी ॥1॥ नको लावूं आह्मां सवें तूं तोंवरी । पाहा दूरवरी विचारूनी ॥ध्रु.॥ साहे संतजन केले महाराज । न घडे आतां तुज भेइऩन मी ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे अहिक्यें ऐक्यता । वाढतें अनंता दुःखें दुःख ॥3॥ 2988 नये सोमसरी उपचाराची हरी । करकरेचें करीं काळें तोंड ॥1॥ मागतों इतुकें जोडुनियां कर । ठेउनियां शीर पायांवरी॥ध्रु.॥ तुह्मां आह्मां एके ठायीं सहवास । येथें द्वैत द्वेष काय बरा ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे बहुतां बहुतां रीती । अनंता विनंती परिसावी हे॥3॥ 2989 लालुचाइऩसाटीं बळकाविसी भावा । परी मी जाण देवा जिरों नेदीं ॥1॥ असों द्या निश्चय हा मनीं मानसीं । घातली येविशीं दृढ कास ॥ध्रु.॥ मज आहे बळ आळीचें सबळ । फोडीन अंत्राळ हृदय तुझें ॥2॥ करुणारसें तुकयाबंधु ह्मणे भुलवीन । काढूनि घेइऩन निज वस्तु ॥3॥ 2990 तुझीं वर्में आह्मां ठावीं नारायणा । परी तूं शाहाणा होत नाहीं ॥1॥ मग कालाबुली हाका देते वेळे । होतोसि परी डोळे नुघडिसी ॥ध्रु.॥ जाणोनि अYाान करावें मोहरें । खोटी खोडी हे रे तुझी देवा ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे कारण प्रचीति । पाहातों वेळ किती तेच गुण ॥3॥ 2991 अवघीं तुज बाळें सारिखीं नाहीं तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥1॥ ह्मणतां लाज नाहीं सकळांची माउली । जवळी धरिलीं एकें दुरी ॥ध्रु.॥ एकां सुख द्यावें घेऊनि वोसंगा । एक दारीं गळा श्रमविती ॥2॥ एकां नवनीत पाजावें दाटून । एकें अन्न अन्नें करितील ॥3॥ एकें वाटतील न वजावीं दुरी । एकांचा मत्सर जवळी येतां ॥4॥ तुकयाबंधु ह्मणे नावडतीं त्यांस । कासया व्यालास नारायणा ॥5॥ 2992 निनांवा हें तुला । नांव साजे रे विठ्ठला । बरा शिरविला । फाटक्यामध्यें पाव ॥1॥ कांहीं तरी विचारिलें । पाप पुण्य ऐसें केलें । भुरळें घातलें । एकाएकीं भावासी ॥ध्रु.॥ मुद्राधारणें माळ माळा टिळे । बोल रसाळ कोंवळे । हातीं फांशाचे गुंडाळे । कोण चाळे गृहस्था हे ॥2 ॥ तुकयाबंधु ह्मणे मििस्कन । करितोसी देखोन । पाहा दुरिवरी वििच्छन्न । केला परी संसार ॥3॥ 2993 नाहीं घटिका ह्मणसी । लाग लागला तुजपाशीं । पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥1॥ माझें नेलें पांघरुण । ठावें असोन दुर्बळ दीन । माणसांमधून । उठविलें खाणो†या ॥ध्रु.॥ आह्मीं हें जगऊनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनि । जालासी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे केलें। उघडें मजचि उमगिलें । ऐसें काय गेलें । होतें तुज न पुरतें॥3॥ 2994 कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ । ह्मणवितोसी परि केवळ । गळेकाटू दिसतोसी ॥1॥ काय केलें होतें आह्मीं । सांग तुझें एकये जन्मीं । जालासी जो स्वामी । एवढी सत्ता करावया॥ध्रु.॥ भलेपणाचा पवाडा । बरा दाविला रोकडा । करूनि बंधु वेडा । जोडा माझा विखंडिला ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे भला । कैसें ह्मणताती तुजला । जीव आमुचा नेला । अंत पाहिला कांहींतरी॥3॥ 2995 आतां कळों आले गुण । अवघे चि यावरोन । चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥1॥ या नांवें कृपासिंधु । ह्मणवितोसी दीनबंधु । मज तरी मैंदु । दिसतोसी पाहातां ॥ध्रु.॥ अमळ दया नाहीं पोटीं । कठीण तैसाचि कपटी । अंधऑयाची काठी । माझी गुदरसी च ना ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे पुरता । नाहीं ह्मुण बरें अनंता। एरवीं असतां । तुझा घोंट भरियेला ॥3॥ 2996 काय सांगों हृषीकेशा । आहे अनुताप आला ऐसा । गिळावासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥1॥ माझें बुडविलें घर। लेंकरें बाळें दारोदार । लाविलीं काहार । तारातीर करोनि ॥ध्रु.॥ जीव घ्यावा कीं द्यावा । तुझा आपुला केशवा । इतुकें उरलें आहे। भावाचिया निमित्यें ॥2॥ तुकयाबंधु ह्मणें जग । बरें वाइऩट ह्मणो मग । या कारणें परी लाग । न संडावा सर्वथा ॥3॥ 2997 मायबाप निमाल्यावरी । घातलें भावाचे आभारीं । तो ही परि हरी । तुज जाला असमाइऩ ॥1॥ हे कां भिHचे उपकार। नांदतें विध्वंसिलें घर । प्रसन्नता वेव्हार । सेवटीं हे जालासी ॥ध्रु.॥ एका जिवावरी । होतों दोनी कुटुंबारी । चाळवूं तो तरीं । तुज येतो निर्लज्जा ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे भला । आणीक काय ह्मणावें तुला । वेडा त्यानें केला । तुजसवें संबंधु ॥3॥ 2998 पूवाअ पूर्वजांची गती । हे चि आइऩिकली होती । सेवे लावूनि श्रीपती । नििंश्चती केली तयांची ॥1॥ कां रे पाठी लागलासी। ऐसा सांग हृषीकेशी । अद्यापवरी न राहासी । अंत पाहासी किती ह्मुण ॥ध्रु.॥ जन्मजन्मांतरीं दावा । आह्मां आपणां केशवा । निमित्य चालवा । काइऩसयास्तव हें ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे अदेखणा । किती होसी नारायणा । देखों सकवेना । खातयासी न खात्या ॥3॥ 2999 निसुर संसार करून । होतों पोट भरून । केली विवसी निर्माण । देवपण दाखविलें ॥1॥ ऐसा काढियेला निस । काय ह्मुण सहित वंश । आणिलें शेवटास । हाउस तरी न पुरे॥ध्रु.॥ उरलों पालव्या सेवटीं । तें ही न देखवे दृष्टी । दोघांमध्ये तुटी । रोकडीचि पाडीली ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे गोड । बहु जालें अति वाड । ह्मणोनी कां बुड । मुऑयांसहित खावें ॥3॥ 3000 बरा जाणतोसी धर्मनीती । उचित अनुचित श्रीपती। करूं येते राती । ऐसी डोळे झांकूनि ॥1॥ आतां जाब काय कैसा। देसी तो दे जगदीशा । आणिला वोळसा । आपणां भोंवता ॥ध्रु.॥ सेवेचिया सुखास्तव । बळें धरिलें अYाानत्व । येइल परि हा भाव। ज्याचा त्यासी कारणा ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे नाहीं । आतां आह्मां बोल कांहीं । जडोनियां पायीं । तुझे त्वां चि घेतलें ॥3॥ [[वर्ग:गाथा]] l5r9yy6fpp23ubt3sbuvigrrfmq4gpq तुकाराम गाथा/ ३००१ ते ३३०० 0 1543 36907 36882 2026-09-19T19:41:51Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36907 wikitext text/x-wiki 3001 कांहीं विपित्त अपत्यां । आतां अमुचिया होतां । काय होइऩल अनंता । पाहा बोलों कासया ॥1॥ बरें अनायासें जालें। सायासेंविण बोले चाले । काबाड चुकलें । केलें कष्टावेगळें ॥ध्रु.॥ बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा । बोलायासी तुझा । उजुरचि नाहींसा ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे दगा । बरा दिला होता बागा । झडकरी चलागा । चांग दैवें पावलों ॥3॥ 3002 देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ॠण । आहे तें कां नेदिसी अझून । अवगलासीं झोंडपणें । परी मी जाण जीवें जिरों नेदीं ॥1॥ कळों येइऩल रोकडें । उभा करिन संतांपुढें । तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां ॥ध्रु.॥ आजिवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता । कवडीचा तो आतां । पडों नेदीन फेर ॥2॥ ठेविला ये जीवनीं जीव । ह्मणे तुकयाचा बंधव । माझा गळा तुझा पाव । एके ठायीं बांधेन ॥3॥ 3003 मागें असताशी कळला । उमस घेऊं नसता दिला। तेणें चि काळें केला । असता अवघा निवाडा ॥1॥ इतका न लगता उशीर । न धरितों भीडभार । सिद्धासी वेव्हार । कासयासी लागला ॥ध्रु.॥ असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा । धरणें ही दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥2॥ अझुन तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी । तुकयाबंधु ह्मणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥3॥ 3004 आतां न राहें क्षण एक । तुझा कळला रे लौकिक। नेदीं हालों एक । कांहीं केल्यावांचूनि ॥1॥ संबंध पडिला कोणाशीं। काय डोळे झांकितोसी । नेइऩन पांचांपाशीं । दे नाहींतरी वोढूनि॥ध्रु.॥ सुखें नेदीस जाणवलें । नास केल्याविण उगलें । तरि तें ही विचारिलें । आह्मी आहे तुज आधीं ॥2॥ असें च करूनि किती । नागविलीं नाहीं नीती । तुकयाबंधु ह्मणे अंतीं । न सोडिसी ते खोडी॥3॥ 3005 तुज ते सवे आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि ते आह्मांसवें आतां न फावे कांहीं ॥1॥ नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनि । पाहा विचारोनी । आढी धरोनि काम नाहीं॥ध्रु.॥ अवघे राहिले प्रकार । जालों जीवासी उदार । असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥2॥ आतां निदसुर नसावें । गाठ पडली कुणब्यासवें । तुकयाबंधु ह्मणे राखावें । देवा महत्व आपुलें॥3॥ 3006 बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आह्मां । काय सांगणें तें सांग ॥1॥ देणें आहे कीं भांडाइऩ । करणें आहे सांग भाइऩ । आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥ध्रु.॥ मागें गेलें जें होउनी । असो तें धरित नाहीं मनीं । आतां पुढें येथूनि । कैसा काय विचार ॥2॥ सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु ह्मणे खळखळ । करावी ते उरेल ॥3॥ 3007 आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके। जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाटीं ॥1॥ नये सरतां नव्हे भलें । तुझें लक्षण कळलें । बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥ध्रु.॥ दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैंदाचे चाळे । दिसताती ये वेळे । काय करूं विसंबोनि ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे देखतां । अंध बहिर ऐकतां । कैसें व्हावें आतां । इतकियाउपरी॥3॥ 3008 तिहीं ताळीं हेचि हाक । ह्मणती पांढरा स्फटिक । अवघा बुडविला लौकिक । सुखें चि भीके लाविलीं ॥1॥ थोंटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं । ह्मणोनि शाहाणे ते कोणी। तुझे दारीं बैसतिना ॥ध्रु.॥ निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा । नागवणा या नांवा । वांचूनि दुजा नाइकों ॥2॥ सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण । तुकयाबंधु ह्मणे चरण । आतां जीवें न सोडीं ॥3॥ 3009 तो चि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज। न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥1॥ तूं तर न होसी शाहाणा। नये सांगतों तें ही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥ध्रु.॥ न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट । कास घालूनियां नीट । चौघाचार करावा ॥2॥ आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन । न पडे तयाविण । गांठी तुकयाबंधु ह्मणे॥3॥ 3010 हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । न करिसी परी पुढें ॥1॥ मी तों सांगून उतराइऩ । जालों आतां तुज काइऩ । कळों येइऩल भाइऩ । तैसा करीं विचार ॥ध्रु.॥ मागें युगें अठ्ठाविस । जालीं दिवसाचा दिवस । मुदल व्याज कासावीस। होसी देवा ये कामें ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे राखें । आतां टाकीं तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाउकें । जालें नाहीं खंडलेंसें ॥3॥ 3011 पत्र उचटिलें प्रेत्नें । ग्वाही कराया कारणें । नाहींतरी पुण्यें । तुझ्या काय उणें आह्मां ॥1॥ नांव तुझें चि करोनि । आहों सुखें पोट भरोनि । केली जाणवणी । ह्मणउनि नाहीं ह्मणसील॥ध्रु.॥ आतां इतकियाउपरी । दे नको भलतें करीं । ह्मणती ॠणकरी । आमुचा इतकें उदंड ॥2॥ तुकयाबंधु जागा । अळवावया पांडुरंगा। केला कांहीं मागायाची नव्हती गरज ॥3॥ 3012 माझ्या भावें केली जोडी । न सरेसी कल्पकोडी । आणियेलें धाडी । घालुनि अवघें वैकुंठ ॥1॥ आतां न लगे यावें जावें । कोठें कांहीं च करावें । जन्मोजन्मीं खावें । सुखें बैसोनसें जालें ॥ध्रु.॥ असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर । न माये अपार । त्रिभुवनीं सांटवितां ॥2॥ अवघें भरलें सदोदित । जाले सुखाचे पर्वत । तुकयाबंधु ह्मणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥3॥ 3013 आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी आगर । आला सकळसिद्धींचा ॥1॥ जालों निधाइऩ निधानें। लागलें अनंतगुणरत्न । जन्माचें वििच्छन्न । दुःख जालें दारिद्र॥ध्रु.॥ तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवलें आलें येथें । ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा। आतां पुरुषोत्तमा । ऐसा सवदागर सांपडला ॥3॥ 3014 सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूवाअचिया ॥1॥ सुखें आनंदरूप आतां । आह्मी आहों याकरितां । निवारली चिंता । देणें घेणें चुकलें ॥ध्रु.॥ जालें भांडवल घरिंचें । अमुप नाम विठ्ठलाचें । सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे फिटला । पांग नाहीं बोलायाला। चाड दुसरी विठ्ठ्ला । वांचूनियां आणीक ॥3॥ ॥37॥ 3015 काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं । वास पंढरीचा जन्म सदा देइप । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥1॥ कृपा देइप दान हरि मज कृपा देइप दान । नासीं त्रिमिर दाखवीं चरण । आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ध्रु.॥ नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण ज्यागृतिं स्वप्नीं । संतसमागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥2॥ पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता । नाहीं आडताळा त्रैलाक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणीं ठेवूनि माथा ॥3॥ 3016 तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लाहान नेणे ॥1॥ परी तो त्या विशेष मानुष होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥ बेरसा गाढव माया ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥3॥ 3017 मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥1॥ आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥ मद्यपीर पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥3॥ 3018 मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥1॥ काय धाक आह्मां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥ शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भHांसाटीं ॥2॥ पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥3॥ 3019 राम ह्मणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥1॥ राम ह्मणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥ राम ह्मणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥2॥ राम ह्मणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥3॥ राम ह्मणतां धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥4॥ राम ह्मणतां ह्मणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥5॥ 3020 मरोनि जाइऩन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥1॥ चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥ केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥2॥ काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥3॥ तुकयाबंधु ह्मणें अवघ्या देशदिशा । मुH रे परेशा तुझ्या पुण्यें ॥4॥ 3021 आतां मागतों तें ऐक नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां॥1॥ असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥ मातेचिया परी देखती परनारी। ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥2॥ तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा ही देख प्रेत्न ॥3॥ सकळ इंिद्रयांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि भ्रम ॥4॥ तुकयाबंधु ह्मणे ते चि वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा॥5॥ 3022 नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥1॥ परउपकारीं वेचियेल्या शHी । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥ध्रु.॥ द्वयें द्वैतभाव नाहीं जया चित्तीं । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥2॥ जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मिस्थती जाणीतली ॥3॥ उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भिH मानव तो ॥4॥ तुकयाबंधु ह्मणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥5॥ 3023 चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा ॥1॥ उत्पित्तसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन ह्मणवीतसे ॥ध्रु.॥ असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥2॥ लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उिच्छष्टकवळा पसरी मुख ॥3॥ तुकयाबंधु ह्मणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥4॥ 3024 कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं । जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥1॥ भला रे पुंडलिका भला। महिमा नव जाये वणिऩला । दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥ केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें । दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे किल्ल्या। संताचे हातीं दिल्या । आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥3॥ 3025 पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन। पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥1॥ ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ । केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥ थोर या युगाचें आश्चर्य । ब्रह्मकर्म उत्तम सार । सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥2॥ ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ । नाहीं जाली ऐसी नीत । हा हा भूत पातलें ॥3॥ शांति क्षमा दया । भावभिH सित्क्रया । ठाव नाहीं सांगावया । सkवधैर्य भंगिलें ॥4॥ राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म । ह्मणवितां रामराम । श्रम महा मानिती॥5॥ थेर भोरपाचे विशीं । धांवती भूतें आविसा तैसीं । कथा पुराण ह्मणतां सिसी । तिडीक उठी नक†याचे ॥6॥ विषयलोभासाटीं । सवाथॉसीं प्राण साटी । परमार्थी पीठ मुठी। मागतां उठती सुनींसीं॥7॥ धनाढए देखोनि अनामिक । तयातें मनिती आवश्यक । अपमानिले वेदपाठक । सािkवक शास्त्रYा संपन्न ॥8॥ पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी । सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या॥9॥ खोटें जालें आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी । भ्रतारें तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥10॥ नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा । पोटासाटीं खौसा । वंदिती मलिंछाच्या॥11॥ बहुत पाप जालें उचंबळ । उत्तम न ह्मणती चांडाळ। अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥12॥ कैसें जालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न । विडे घेऊनि ब्राह्मण। अविंदवाणी वदताती ॥13॥ कामिनी विटंबिल्या कुळवंती। वदनें दासीचीं चुंबिती । सोवऑयाच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥14॥ मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी । केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥15॥ केवढी दोषाची सबळता। जाली पाहा हो भगवंता । पुण्य धुडावोनी संता । तीर्थां हरी आणिली ॥16॥ भेणें मंद जाल्या मेघवृिष्ट । आकांतली कांपे सृिष्ट । देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥17॥ अपीक धान्यें दिवसें दिवसें। गाइऩ ह्मैसी चेवल्या गोरसें । नगरें दिसती उध्वंसें । पिकलीं बहुवसें पाखांडें ॥18॥ होम हरपलीं हवनें । यYायाग अनुष्ठानें । जपतपादिसाधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥19॥ अठरा यातींचे व्यापार। करिती तस्कराइऩ विप्र । सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळीं पांघरती ॥20॥ गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं । अश्वाचियापरी। कुमारी विकिती वेदवHे ॥21॥ वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयांची । आवडी पंडितांची। मुसाफावरी बैसली ॥22॥ मुख्य सवाौत्तम साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीनें । कुडीं कापटें महा मोहनें। मिरविताती दुर्जन ॥23॥ कळाकुशळता चतुराइऩ । तर्कवादी भेद निंदेठायीं । विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसीं नाडलीं ॥24॥ जे संन्यासी तापसी ब्रह्मचारी। होतां वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी। कामक्रोधें व्यापिले भारी। इच्छाकरीं न सुटती ॥25॥ कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक । पिते पुत्र सहोदर। एकाएक शत्रुघातें वर्त्तती ॥26॥ केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन । याती अठरा चा†ही वर्ण । कदऩम करूनि विटाळले ॥27॥ पूवाअहोतें भविष्य केलें । संतीं ते यथार्थ जालें । ऐकत होतों ते देखिलें।प्रत्यक्ष लोचनीं ॥28॥ आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्येंवागवरावें । देवासी भाकोनि करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥29॥ अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका । धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥30॥ 3026 केली हार्णाळां अंघोळी । येऊनि बैसलों राउळीं॥1॥ अजिचें जाले भोजन । राम कृष्ण नारायण ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥3॥ ॥12॥ 3027 तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥1॥ सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हा चि मनीं ॥ध्रु.॥ आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥2॥ प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥3॥ तुका ह्मणे आतां कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥4॥ 3028 कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुह्मां कोणा ॥1॥ लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥ गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥2॥ सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥3॥ तुका ह्मणे गाइऩवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥4॥ 3029 एकाचिये सोइऩ कवित्वाचे बांधे । बांधिलिया साध्य काय तेथें ॥1॥ काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥ कवित्वाचे रूढी पायां पाडी जग । सुखावोनि मग नरका जाय ॥2॥ तुका ह्मणे देव केल्याविण साहे । फजिती आहे लटिक्या अंगीं ॥3॥ 3030 भल्याचें दरुषण । तेथें शुभ चि वचन ॥1॥ बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥ मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥2॥ तुका ह्मणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥3॥ 3031 आवडीनें धरिलीं नांवें । िप्रयभावें चिंतन ॥1॥ वेडा जाला वेडा जाला । लांचावला भHीसी ॥ध्रु.॥ निचाडएा चाड धरी । तुळसी करीं दळ मागे ॥2॥ धरिला मग न करी बळ । तुका ह्मणे कळ पायीं ॥3॥ 3032 कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥1॥ ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु.॥ संतांचिये पायीं । वेळोवेळां ठेवीं डोइऩ ॥2॥ तुका ह्मणे तरें । भवसिंधु एका सरें॥3॥ 3033 विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥1॥ वाये टाळ टाऑयाटाळी । होइल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥ विठ्ठल आद्ये अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥2॥ तुका ह्मणे विठ्ठलवाणी। वदा कानीं आइऩका ॥3॥ 3034 पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥1॥ पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥ मूढ पापी जैसे तैसे। उतरी कासे लावूनि ॥2॥ तुका ह्मणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥3॥ 3035 अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥1॥ ऐसियांचा संग देइप नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥ध्रु.॥ उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥2॥ तुका ह्मणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥3॥ 3036 पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥1॥ वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥ मागील परिहार पुढें नेहे सीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥2॥ तुका ह्मणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चित्तीं निवडेना ॥3॥ 3037 न कळे तें कळों येइऩल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥1॥ न दिसे तें दिसों येइऩल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥ न बोलों तें बोलों येइऩल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥2॥ न भेटे तें भेटों येइऩल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥3॥ अलभ्य तो लाभ होइऩल अपार । नाम निरंतर ह्मणतां वाचे ॥4॥ तुका ह्मणे आसH जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥5॥ 3038 बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥1॥ जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥ गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥2॥ तुका ह्मणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥3॥ 3039 भिHप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां Yाानियांसी ॥1॥ आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुH । तरी भिH सुख दुर्लभ त्यां ॥2॥ तुका ह्मणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥3॥ 3040 दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥1॥ कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥ मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राह्मणाचे लीळे वर्तूं नेणे ॥2॥ जरी तो ब्राह्मण जाला कर्मभ्रष्ट । तुका ह्मणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥3॥ 3041 देव भHालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥1॥ भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । ह्मणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥ स्त्री द्यावी गुणवंती नसती गुंते आशा । यालागीं कर्कशा पाठी लावी ॥2॥ तुका ह्मणे मज प्रचित आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥3॥ 3042 वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥1॥ अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥ येरू ह्मणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥2॥ देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥3॥ येरू ह्मणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥4॥ गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥5॥ 3043 जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥1॥ रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चित्त तें ते घडी ॥ध्रु.॥ धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥2॥ तुका ह्मणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥3॥ 3044 तुज न भें मी किळकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥1॥ माझा बिळया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥ शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥2॥ कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥3॥ वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥4॥ हिरण्यकश्यप विदारिला । भH प्रल्हाद रिक्षला ॥5॥ वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य॥6॥ छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥7॥ शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥8॥ मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥9॥ पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥10॥ गजेंद्र स्मरे राम राम। त्यासी पाववी वैकुंठधाम ॥11॥ तुका ह्मणे हरिरूप जाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥12॥ 3045 सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥1॥ पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥ भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥2॥ ह्मणोनि विवेकें । कांहीं करणें निकें । तुका ह्मणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥3॥ 3046 देवावरी भार । वृित्त अयाचित सार ॥1॥ देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥ विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥2॥ तुका ह्मणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥3॥ 3047 वर्त्ततां बासर । काय करावें शरीर ॥1॥ ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥ नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥2॥ तुका ह्मणे भले । जन्मा येऊनियां जाले ॥3॥ 3048 केली प्रYाा मनाशीं । तइप मी दास सत्यत्वेशीं । नेइऩन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥1॥ तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥ ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पािळल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥2॥ घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता। तुका ह्मणे चिंता । काय पाहें मारगा ॥3॥ 3049 नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं भावप्रेम ॥1॥ उघडा मंत्र जाणा राम कृष्ण ह्मणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥ मंत्र यंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥2॥ सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥3॥ 3050 संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥1॥ काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥ शेष घेइऩन उिच्छष्ट । धाय धणीवरी पोट ॥2॥ तुका ह्मणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥3॥ 3051 जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द [[गोड]] ॥1॥ आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥2॥ तुका ह्मणे काय देऊं परिहार । काय ते साचार जाणतसें ॥3॥ 3052 देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । िस्त्रयेसी पाठवी उंच साडी ॥1॥ गाइऩचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥ लेकराची रास स्वयें धांवें क्षाळूं ॥ न ह्मणे प्रक्षाळूं द्विजपायां ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या तोंडावरि थुंका । जातो यमलोका भोगावया ॥3॥ 3053 उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥1॥ अतीत देखोनि होय पाठमोरा । व्याहएासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥ द्विजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुकाऩचे दासीचा लेंक होय ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥3॥ 3054 ब्रह्मYाान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥1॥ शास्त्रांचे भांडण जप तीर्थाटणें । उर्वीचें भ्रमण या च साटीं ॥ध्रु.॥ याचसाटीं जप याचसाटीं तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥2॥ या च साटीं संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका ह्मणे ॥3॥ 3055 गायत्री विकोन पोट जे जािळती । तया होय गति यमलोकीं ॥1॥ कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥ नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥2॥ आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि । न लगे दुराचारी तुका ह्मणे ॥3॥ 3056 साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥1॥ वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥2॥ तुका ह्मणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥3॥ 3057 राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥1॥ न करी स्नान संध्या ह्मणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहनिऩशी ॥ध्रु.॥ देवाब्राह्मणासी जाइऩना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥2॥ सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें॥3॥ तुका ह्मणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥4॥ 3058 दुर्बुिद्ध ते मना । कदा नुपजो नारायणा ॥1॥ आतां ऐसें करीं । तुझे पाय चित्तीं धरीं ॥ध्रु.॥ उपजला भाव । तुमचे कृपे सिद्धी जावो ॥2॥ तुका ह्मणे आतां । लाभ नाहीं या परता ॥3॥ 3059 तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥1॥ तैसें तुह्मां आह्मां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥ उदकावरील तरंग।तरंग उदकाचें अंग ॥2॥ तुका ह्मणे बिंबच्छाया । ठायीं पावली विलया॥3॥ 3060 साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥1॥ मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥ वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥2॥ ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥3॥ तुका ह्मणे शहाणा होइप रे गव्हारा । चो†यासीचा फेरा फिरों नको ॥4॥ 3061 चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । ग†हवार बोभाट जनामध्यें ॥1॥ लटिके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥2॥ तुका ह्मणे अंतीं वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥3॥ 3062 माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥1॥ विसरतां रूप क्षण एक चित्तीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥ विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥2॥ तुका ह्मणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥3॥ 3063 काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या ॥1॥ झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥ हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥2॥ तुका ह्मणे किती जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥3॥ 3064 थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥1॥ व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥ घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥2॥ तुका ह्मणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥3॥ 3065 जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥1॥ सांडोनियां वाळवंट । काय इिच्छसी वैकुंठ ॥ध्रु.॥ खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥2॥ साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥3॥ 3066 जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुिHस जावा॥1॥ पोटा येतां हरलें पापा । Yाानदेवा मायबापा ॥ध्रु.॥ मुळीं बाप होता Yाानी । तरी आह्मी लागलों ध्यानीं ॥2॥ तुका ह्मणे मी पोटींचें बाळ । माझी पुरवा ब्रह्मींची आळ ॥3॥ 3067 संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥1॥ भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥ संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥2॥ तुका ह्मणे केली प्रYाा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥3॥ 3068 बहु टाळाटाळी । होतां भोवताहे कळी ॥1॥ बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥ मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥2॥ अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥3॥ 3069 जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ ॥1॥ हें चि वोसनावोनी उठी । देव सांटविला पोटीं ॥ध्रु.॥ नाहीं ओढा वारा। पडिला प्रसंग तो बरा ॥2॥ तुका ह्मणे जाली । मज हे अनावर बोली ॥3॥ 3070 गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥1॥ कैचें पुण्य तया गांठी । व्रतें वेची लोभासाटीं ॥ध्रु.॥ वाढावें संतान। गृहीं व्हावें धनधान्य ॥2॥ मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥3॥ तुका ह्मणे मोल । देउन घेतला सोमवल ॥4॥ 3071 बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥1॥ विटू दांडू चेंडू लगो†या वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥ हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥2॥ सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥3॥ तुका ह्मणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥4॥ 3072 तारुण्याच्या मदें न मनी कोणासी । सदा मुसमुसी खूळ जैसा ॥1॥ अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे ह्मैसा जनामधीं ॥ध्रु.॥ हातीं दीडपान वरती च मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥2॥ श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥3॥ तुका ह्मणे ऐसा थोर हा गयाळी । करितां टवाळी जन्म गेला ॥4॥ 3073 ह्मातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥1॥ खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ध्रु.॥ बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥2॥ सेजारी ह्मणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आह्मां ॥3॥ तुका ह्मणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥4॥ 3074 जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥1॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा। तृण मागों नये जाणा ॥2॥ तुका ह्मणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥3॥ 3075 लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥1॥ पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥ कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥2॥ तुका ह्मणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥3॥ 3076 व्यभिचारिणी गणिका कुंटणी । विश्वास चि मनीं राघोबाचा ॥1॥ ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं टेवियेली ॥ध्रु.॥ पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥2॥ तुका ह्मणे विठोबाची धरा सोय । आणिक उपाय नेणों किती ॥3॥ 3077 गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥1॥ सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥ कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघांजणा तारियेलें ॥2॥ तुका ह्मणे नेले वाऊनि विमानी । मी ही आइऩकोनी विश्वासलों ॥3॥ 3078 ब्रह्मयाचे वेद शंखासुरें नेले । त्यासाटीं धरिलें मत्स्यरूप ॥1॥ तेणें आत्मा नव्हता नेला ब्रह्मांडासी । काय ब्रह्मयासी नव्हतें Yाान ॥ध्रु.॥ परि तेणें धावा केला आवडीनें । जाले नारायण कृपासिंधु ॥2॥ तुका ह्मणे विठोबा मी नामधारक । पोसनें सेवक भेटी देइप ॥3॥ 3079 देवीं आणि दैतीं सिंधू गुसिळला । भार पृथ्वीस जाला साहावेना ॥1॥ जालासी कासव धरिली पाठीवरी । चिंता तुज हरी सकळांची ॥ध्रु.॥ तये काळीं देव करिताती स्तुती । कृपाळु श्रीपती ह्मणोनियां ॥2॥ तुका ह्मणे ऐसे उदंड पवाडे । ज्यासी सहस्र तोंडें सिणला तो ही ॥3॥ 3080 हिरण्याक्ष दैत्य मातला जे काळीं । वरदानें बळी शंकराच्या ॥1॥ इंद्रपदराज्य घेतलें हिरोनी । देवा चक्रपाणी ह्मणती धांव ॥ध्रु.॥ तइं पांडुरंगा शूकर जालेती । तया दैत्यपती मारविले॥2॥ तुका ह्मणे ज्यांचीं राज्यें त्यांसी दिलीं । ऐसी तूं माउली पांडुरंगा॥3॥ 3081 प्रल्हादाकारणें नरसिंहीं जालासी । त्याचिया बोलासी सत्य केलें ॥1॥ राम कृष्ण गोविंदा नारायणा हरि । गर्जे राजद्वारीं भHराज ॥ध्रु.॥ विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणें दैत्यराव दचकला ॥2॥ तुका ह्मणे तयां कारणें सगुण । भHांचें वचन सत्य केलें ॥3॥ 3082 नामाचें सामर्थ्य कां रे दवडीसी । कां रे विसरसी पवाडे हे ॥1॥ खणखणां हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही ॥ध्रु.॥ राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणें पडे धाक बिळयासी ॥2॥ असों द्यावीं सामथ्यॉ ऐसिया कीर्तीचीं । आवडी तुक्याची भेटी देइप ॥3॥ 3083 [[वाटी]]भर विष दिलें प्रल्हादासी । निर्भय मानसीं तुझ्याबळें ॥1॥ भोHा नारायण केलें तें प्राशन । प्रतापें जीवन जालें तुझ्या ॥ध्रु.॥ नामाच्या चिंतनें विषाचें तें आप । जाहालें देखत नारायणा ॥2॥ तुका ह्मणे ऐसे तुझे बडिवार । सिणला फणीवर वर्णवेना ॥3॥ 3084 अिग्नकुंडामध्यें घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना ॥1॥ पितियासी ह्मणे व्यापक श्रीहरि । नांदतो मुरारी सर्वां ठायीं ॥ध्रु.॥ अिग्नरूपें माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाक मारी ॥2॥ तुका ह्मणे अिग्न जाहाला शीतळ । प्रताप सबळ विठो तुझा ॥3॥ 3085 कोपोनियां पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥1॥ येरू ह्मणे काष्ठीं पाषाणीं सकळीं । आहे वनमाळी जेथें तेथें ॥ध्रु.॥ खांबावरी लात मारिली दुर्जनें । खांबीं नारायण ह्मणतां चि ॥2॥ तुका ह्मणे कैसा खांब कडाडिला । ब्रह्मा दचकला सत्यलोकीं ॥3॥ 3086 डळमिळला मेरु आणि तो मांदार । पाताळीं फणिवर डोइऩ झाडी ॥1॥ लोपे तेजें सूर्य आणीक हा चंद्र । कांपतसे इंद्र थरथरां ॥ध्रु.॥ ऐसें रूप उग्र हरीनें धरिलें । दैत्या मारियेलें मांडीवरी॥2॥ तुका ह्मणे भHांकारणें श्रीहरि । बहु दुराचारी निदाऩिळले ॥3॥ 3087 बहुत कृपाळु दीनाचा दयाळु । जगीं भHवत्सळु नाम तुझें ॥1॥ मानियेला चित्तीं बळीचा उपकार । अझूनि त्याचें द्वार राखसील ॥ध्रु.॥ काय त्याच्या भेणें बैसलासी द्वारीं । नाहीं तुज हरि कृपा बहु ॥2॥ तुका ह्मणे भHजनाची ममता । तुह्मांसी अनंता अलोलिक ॥3॥ 3088 पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥1॥ दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गा†हाणें सांगावया ॥ध्रु.॥ बिळचिये द्वारीं तुह्मी बैसलेती । दुर्वास विनंती करी भावें ॥2॥ तुका ह्मणे कृपासागरा श्रीहरी । तुझी भHावरी प्रेमच्छाया ॥3॥ 3089 दुर्वासया स्वामी गुंतलों भाकेसी । पुसा जा बळीसी निरोप द्यावा ॥1॥ त्याचे आYोविण आह्मां येतां नये । द्वारपाळ राहें होऊनियां ॥ध्रु.॥ पुसे दुर्वासया बळीसी जाऊनि । येरू ह्मणे झणी बोलों नका ॥2॥ तुका ह्मणे केला अन्यत्राचा त्याग । तेव्हां पांडुरंग सखा जाला ॥3॥ 3090 बळी ह्मणे आजि दुर्वासया स्वामी । मागों नका तुह्मी नारायणा ॥1॥ बहुतां प्रयासीं जोडला श्रीहरी । बैसविला द्वारीं राखावया ॥ध्रु.॥ परतला दुर्वास मग हो तेथूनि । चिंतातुर मनीं उद्वेगला ॥2॥ काय तूं एकाचा आहेसी अंकित । होइप कृपावंत तुका ह्मणे ॥3॥ 3091 त्रैलोकींचा नाथ सकळांचा आधार । बिळचें तुवां घर धरियेलें ॥1॥ आह्मां मोकलिलें कोणां निरविलें । कोणा हातीं दिले तिन्ही लोक ॥ध्रु.॥ अनाथांचा बंधु दासांचा कैवारी । िब्रदें तुझीं हरी जाती वांयां ॥2॥ तुका ह्मणे ऐसें बोलिला दुर्वास । वाटला संतोष पांडुरंगा ॥3॥ 3092 बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया । जाय पुसावया मागत्यानें ॥1॥ मागुता दुर्वास पुसे बिळराया । निरोप जावया देइप देवा ॥ध्रु.॥ बळी ह्मणे त्यासी जाय मी न ह्मणें । जाइऩल नारायण लागला ची ॥2॥ मजपाशीं राहें कोठें तरीं जाय । तुका ह्मणे पाय न सोडीं मी ॥3॥ 3093 दुर्वासें निरोप आणिला ये रिती । मग वाढलेती नारायणा ॥1॥ ठेविलें चरण बिळचिये द्वारीं । शीर अंगावरी लांबविलें ॥ध्रु.॥ पाडियेलें द्वार द्वारावतियेसी । वरि हृषीकेशी निघालेती ॥2॥ तेथूनियां नाम पडिलें द्वारका । वैकुंठनायका तुका ह्मणे ॥3॥ 3094 मुरुकुश दोन्ही मारिले आसुर । दुर्वास ॠषीश्वर सुखी केला ॥1॥ मारियेला मुरु ह्मणोनी मुरारी । नाम तुझें हरी पडियेलें ॥ध्रु.॥ पूवाअहुनी ऐसा भिHप्रतिपाळ । केला त्वां सांभाळ नारायणा ॥2॥ तुका ह्मणे ये चि वेळे काय जालें । कां सोंग धरिलें मोहनाचें ॥3॥ 3095 गुरुपादाग्रींचें जळ । त्यास मानी जो विटाळ ॥1॥ संतीं वािळला जो खळ । नरकीं पचे चिरकाळ ॥ध्रु.॥ गुरुतीथाअ अनमान । यथासांग मद्यपान ॥2॥ गुरुअंगुष्टा न चोखी । मुख घाली वेश्येमुखीं ॥3॥ तुका ह्मणे सांगों किती । मुखीं पडो त्याचे माती ॥4॥ 3096 वाढविलें कां गा । तुह्मी एवढें पांडुरंगा ॥1॥ काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥ ब्रह्मसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥2॥ निमित्याचा धणी । तुका ह्मणे नेणे कोणी ॥3॥ 3097 साही शास्त्रां अतिदुरी तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं क्रीडतो राम ॥1॥ शिवाचें निजदेह वाल्मीकाचें निजगुहे । तो भिल्लटीचीं फळें खाय श्रीराम तो ॥ध्रु.॥ योगियांचे मनीं नातुडे चिंतनीं । वानरांचे कानीं गोष्टी सांगे ॥2॥ चरणीं शिळा उद्धरी नामें गणिका तारी । तो कोिळया घरीं पाहुणा राम॥3॥ क्षण एक सुरवरा नातुडे नमस्कारा । तो रिसा आणि वानरा क्षम दे राम ॥4॥ राम सांवळा सगुण राम योगियाचें ध्यान । राम राजीवलोचन तुका चरण वंदितो ॥5॥ 3098 विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥1॥ विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥ विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥2॥ विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन। सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥3॥ तुका ह्मणे माझा विठ्ठल विसावा। नश्वरित गांवा जाइन त्याच्या ॥4॥ 3099 न मनावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥1॥ ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥ माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥2॥ सुखा आणि दुःखा । ह्मणे वेगळा मी तुका ॥3॥ 3100 माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥1॥ बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥ सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद ह्मणियारा ॥2॥ तुका ह्मणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥3॥ 3101 जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥1॥ येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥ पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥2॥ तुका ह्मणे ज्यावें । सत्य कीर्तीनें बरवें ॥3॥ 3102 सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥1॥ नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥ रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥2॥ तुका ह्मणे कीतिऩ वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥3॥ 3103 तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरि लागे छंदु हरिनामें ॥1॥ येर कर्म धर्म करितां ये कळी । माजी तरला बळी कोण सांगा ॥ध्रु.॥ न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥2॥ न साधवे योग न करवे वैराग्य । साधा भिHभाग्य संतसंगें ॥3॥ नव्हे अनुष्ठान न कळे ब्रह्मYाान । करावी सोपान कृष्णकथा ॥4॥ तुका ह्मणे वर्म दावियेलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥5॥ 3104 लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत॥1॥ त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥ कोटिगोहत्यापातक। त्यासी घडेल निष्टंक ॥2॥ मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥3॥ तुका ह्मणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥4॥ 3105 देह जाइऩल जाइऩल । यासी काळ बा खाइऩल ॥1॥ कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥ लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥2॥ शरीरसंबंधाचें नातें । भोरडएा बुडविती सेतातें ॥3॥ अझुनि तरी होइप जागा । तुका ह्मणे पुढें दगा॥4॥ 3106 मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥1॥ ऐसें ठावें जालें मज बरव्या परी । ह्मणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥ माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥2॥ अझुनि कां नये तुह्मासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥3॥ तुका ह्मणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥4॥ 3107 कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥1॥ तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता जालें जिणें ॥ध्रु.॥ पतितपावन राहिलों या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥2॥ आतां कोण करी माझा अंगीकार । कळलें निष्ठ‍ जालासी तूं ॥3॥ तुका ह्मणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास तुजसाटीं ॥4॥ 3108 तरि कां मागें वांयां कीर्ती वाढविली । जनांत आपुली िब्रदावळी ॥1॥ साच करितां आतां फिरसी माघारा । ठायींचें दातारा नेणवेचि ॥ध्रु.॥ संतांसी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यांसी सांगइऩन ॥2॥ घेइऩन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥3॥ तुका ह्मणे आधीं राहिलों मरोनि । तूं कां होसी धनी निमित्याचा ॥4॥ 3109 आह्मी तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥1॥ तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥ तुझें नाम कंठीं । आह्मां संसार आटी ॥2॥ तुका ह्मणे काळ । करी आह्मांसी विटाळ॥3॥ 3110 लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥1॥ आह्मी नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥ बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥2॥ तुका ह्मणे देवा । रोकडी हे मोडे सेवा॥3॥ 3111 आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय॥1॥ परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥ समाधान त्याचें तो चि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥2॥ तुका ह्मणे होय पीडा ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥3॥ 3112 भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥1॥ तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥ जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥2॥ तुका ह्मणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥3॥ 3113 सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥1॥ न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥ घातला तो आशा। मोहोजाळें गळां फासा ॥2॥ सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥3॥ करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥4॥ लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥5॥ तुका ह्मणे याचें । नांव सोंवळें साचें ॥6॥ 3114 तुज करितां होती ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥1॥ परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥ उलंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥2॥ पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥3॥ अवघें हेळामात्रें हरि । मुH करी ब्रह्मांड॥4॥ तुका ह्मणे खेळे लीळा । पाहे वेगळा व्यापूनि ॥5॥ 3115 पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥1॥ पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥ खोलीं पडे ओली बीज। तरीं च हाता लागे निज ॥2॥ तुका ह्मणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥3॥ 3116 करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥1॥ अहंकार आड । आह्मां जगासी हा नाड ॥ध्रु.॥ येथें भुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥2॥ तुका ह्मणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती॥3॥ 3117 घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥1॥ तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आह्मां तारूं ॥ध्रु.॥ रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥2॥ बुडत्यासाटीं उडी । घालितील कां हे जोडी ॥3॥ सारितील कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥4॥ तुका ह्मणे भार । घेती भागल्यांचा फार ॥5॥ 3118 नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥1॥ अनुभव येथें व्हावा शिष्टाचार । न चलती चार आह्मांपुढें ॥ध्रु.॥ निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥2॥ तुका ह्मणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम॥3॥ 3119 न करि त्याचें गांढेपण । नारायण सिद्ध उभा ॥1॥ भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥ध्रु.॥ याचे सोइऩ पाउल वेचे । मग कैचे आडथळे ॥2॥ तुका ह्मणे खरें खोटें । न ह्मणे मोटें लहान ॥3॥ 3120 रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥1॥ वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥ भ्रमणांच्या मोडीं वाटा। न भरें फाटा आडरानें ॥2॥ तुका ह्मणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥3॥ 3121 पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें॥1॥ आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां हो ॥ध्रु.॥ कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥2॥ कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरिली ॥3॥ किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥4॥ तुका ह्मणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥5॥ 3122 देव जाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥1॥ बरवें जालें बरवें जालें । चित्त धालें महालाभें ॥ध्रु.॥ दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥2॥ तुका ह्मणे सिंधुभेटी । उदका तुटी वाहाळासी ॥3॥ 3123 बहुत प्रकार परि ते गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी॥1॥ सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥ घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥2॥ तुका ह्मणे रस राहिला वचनीं । तो चि पडताळूनि सेवीतसें ॥3॥ 3124 आह्मां सोइरे हरिजन । जनीं भाग्य निकंचन ॥1॥ ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥ भुके तान्हे चित्तीं। सदा देव आठविती ॥2॥ तुका ह्मणे धन । ज्याचें वित्त नारायण ॥3॥ 3125 ह्मणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥1॥ खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा॥ध्रु.॥ आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥2॥ तुका ह्मणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुह्मां ठावा ॥3॥ 3126 जळालें तें बाहए सोंग । अंतर व्यंग पडिलिया॥1॥ कारण तें अंतरलें । वाइट भलें ह्मणवितां ॥ध्रु.॥ तांतडीनें नासी । तांतडीनें च संतोषी ॥2॥ तुका ह्मणे धीर । नाहीं बुिद्ध एक िस्थर॥3॥ 3127 चित्ताचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥1॥ अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥ ब्रह्मांड कवळे आठवणेसाटीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥2॥ तुका ह्मणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न सुटतां॥3॥ 3128 दुखवलें चित्त आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥1॥ कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥ आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥2॥ तुका ह्मणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा॥3॥ 3129 धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥1॥ परारब्धगति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे॥ध्रु.॥ आणीक रोगांचीं नांवें घेऊं किती । अखंड असती जडोनियां ॥2॥ तुका ह्मणे नष्ट संचिताचें दान । पावे खातां पण सुख नेदी ॥3॥ 3130 भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥1॥ येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥ भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥2॥ तुका ह्मणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥3॥ 3131 जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चित्त ठेवीन मी ॥1॥ जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥ जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥2॥ विठ्ठलासी जिहीं दिला सर्व भाव । त्यांच्या पायीं ठाव मागइऩन ॥3॥ तुका ह्मणे रज होइऩन चरणींचा । ह्मणविती त्यांचा हरिचे दास ॥4॥ 3132 काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥1॥ निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥2॥ तुका ह्मणे भावभिH हे कारण । नागवी भूषण दंभ तो चि ॥3॥ 3133 देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥1॥ मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥ गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥2॥ तुका ह्मणे संग । केला दुरि नव्हे मग॥3॥ 3134 माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चित्तीं पांडुरंगा ॥1॥ भांडवल गांठी आलें सपुरतें । समाधान चित्तें मानियेलें ॥ध्रु.॥ उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा॥2॥ तुका ह्मणे मज भHीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं ह्मुण ॥3॥ 3135 एकविध आह्मी न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥1॥ ह्मणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥ बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥2॥ तुका ह्मणे आगा जीवांच्या जीवना । तूं चि नारायणा साक्षी माझा ॥3॥ 3136 राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥1॥ करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥ देइऩन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । साटी करोनियां जीवा॥3॥ 3137 तैसे नहों आह्मी विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥1॥ स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला किळकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥ अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥3॥ 3138 मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाइप विळवतें॥1॥ काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥ अहंकारास उरलें काइऩ । पांचांठायीं हें वांटे ॥2॥ तुका ह्मणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥3॥ 3139 आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥1॥ तें तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसान ॥ध्रु.॥ अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥2॥ तुका ह्मणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीतिऩ मागें ॥3॥ 3140 आजिचें हें मज तुह्मीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥1॥ आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥2॥ तुका ह्मणे तुह्मीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥3॥ 3141 स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥1॥ आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥ इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥2॥ तुका ह्मणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाटीं ॥3॥ 3142 लोह कफ गारा सिद्ध हे सामुग्री । अिग्न टणत्कारी दिसों येतो ॥1॥ सांगावें तें काइऩ सांगावें तें काइऩ । चित्ता होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥ अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥2॥ तुका ह्मणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥3॥ 3143 बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान ॥1॥ काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ ठेविलिये ठायीं । चित्त ठेवुनि असें पायीं ॥2॥ करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा॥3॥ न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥4॥ तुका ह्मणे बुिद्ध । अल्प असे अपराधी ॥5॥ 3144 जाणतों समये । परि मत कामा नये ॥1॥ तुह्मी सांगावें तें बरें । देवा सकळ विचारें ॥ध्रु.॥ फुकाचिये पुसी । चिंता नाहीं होते ऐसी ॥2॥ तुका ह्मणे आहे । धर पाय मज साहे ॥3॥ 3145 द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥1॥ आपुलिया शरणागता । वाहों चिंता नेदावी ॥ध्रु.॥ वचना या चित्त द्यावें । असो ठावें पायांसी ॥2॥ तुका ह्मणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥3॥ 3146 दोहीं बाहीं आह्मां वास । असों कास घालूनि ॥1॥ बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥ एकसरें आYाा केली । असों चाली ते नीती ॥2॥ तुका ह्मणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥3॥ 3147 ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥ जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी ह्मुण ॥2॥ तुका ह्मणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर ह्मणवूनि ॥3॥ 3148 बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥1॥ घडलें हें बहुवा दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥ बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥2॥ दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥3॥ पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली॥4॥ तुका ह्मणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥5॥ 3149 तुझें नाम मुखीं तयासी विपित्त । आश्चर्य हें चित्तीं वाटतसे ॥1॥ काय जाणों काय होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥ भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥2॥ तुका ह्मणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥3॥ 3150 सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥1॥ काय देवा नेणों आलें गांढेपण । तुह्मी शिHहीन जाले दिसां ॥ध्रु.॥ विष्णुदास आह्मी निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥2॥ तुका ह्मणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥3॥ 3151 खेळतां न भ्यावें समर्थाच्या बाळें । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥1॥ तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥ अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी ह्मणऊनि ॥2॥ तुका ह्मणे माझें ऐसें आहे देवा । ह्मणऊनि सेवा समपिऩली ॥3॥ 3152 निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥1॥ पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥ लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥2॥ तुका ह्मणे नव्हतें ठावें । जालें भावें वाटोळें ॥3॥ 3153 नव्हती भेटी तों चि बरें । होतां चोरें नाडिलें ॥1॥ अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ध्रु.॥ चिंतनांचें मूळ चित्त । नेलें वित्त हरूनि ॥2॥ तुका ह्मणे मूळा आलें । होतें केलें तैसें चि ॥3॥ 3154 जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे॥1॥ पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥ आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥2॥ तुका ह्मणे नारायणा । सेवाहीना धिग वृित्त ॥3॥ 3155 सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥1॥ आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥ माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥3॥ 3156 नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥1॥ चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालती ॥ध्रु.॥ नामरूपें रंगा आलीं। ते चि चाली स्वभावें ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगे । अंग संगें कविळलें॥3॥ 3157 खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंतें ॥1॥ माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान॥ध्रु.॥ प्रसादाची वाणी वदें ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥2॥ तुका ह्मणे रस वाढितिया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥3॥ 3158 अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥1॥ याची जाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥ध्रु.॥ बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥2॥ तुका ह्मणे मुळें । खंड जाला एका वेळें॥3॥ 3159 अवघा भार वाटे देवा । संतसेवा न घडतां ॥1॥ कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ध्रु.॥ चुकलोंसा दिसें पंथ । गेले संत तो ऐसा ॥2॥ तुका ह्मणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥3॥ 3160 आतां तुह्मी कृपावंत । साधु संत जिवलग ॥1॥ गोमटें तें करा माझें । भार ओझें तुह्मांसी ॥ध्रु.॥ वंचिलें तें पायांपाशीं। नाहीं यासी वेगळें ॥2॥ तुका ह्मणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥3॥ 3161 सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥1॥ गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल ह्मणे निर्लज्ज ॥ध्रु.॥ अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥2॥ तुका ह्मणे, पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥3॥ 3162 धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तीं च दिसती ॥1॥ आलें आवडीस फळ । जालें कारण सकळ ॥ध्रु.॥ घेइऩन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥2॥ तुका ह्मणे लाड । विठोबा पुरवील कोड॥3॥ 3163 बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥1॥ येथें सावकासें घेइऩन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥ बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमश्रमें होता ॥2॥ बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि जाला ॥3॥ बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥4॥ तुका ह्मणे येथें जालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥5॥ 3164 पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥1॥ आतां काशासाटीं जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥ ऐते अपाहार । आणूनियां भरी घर ॥2॥ मानिली नििंश्चती । नरका जावया उभयतीं॥3॥ झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥4॥ तुका ह्मणे बेटएा ॥ भांडवल न लगे खटएा ॥5॥ 3165 एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥1॥ जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥ कािळमेचें जिणें । जीऊनियां राहे सुनें ॥2॥ तुका ह्मणे गुण । दरुषणें अपशकुन॥3॥ 3166 पुंडलीक भHराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रह्म आणिलें ॥1॥ पांडुरंग बाळमूतिऩ । गाइऩगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥ एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । ह्मणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती॥2॥ पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि-। निषेधाची वसति ॥3॥ पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । रीग न घडे कल्पांतीं ॥4॥ महाक्षेत्र हें पंढरी । अनुपम्य इयेची थोरी । धन्य धन्य वारकरी । तुका ह्मणे तेथींचे॥5॥ 3167 देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥1॥ काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥ नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥2॥ तुका ह्मणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥3॥ 3168 त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥1॥ आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंिद्रयें सकळें काया मन ॥ध्रु.॥ सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥2॥ तुका ह्मणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥3॥ 3169 दावूनियां बंड । पुरे न करी तें भांड ॥1॥ जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥ घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥2॥ तुका ह्मणे धीरें । देवें नुपेिक्षलें खरें ॥3॥ 3170 न पालटे जाती जीवाचिये साटीं । बाहे तें चि पोटीं दावी वरी ॥1॥ अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥ घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥3॥ 3171 दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥1॥ समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥ काकुळतीसाटीं सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥2॥ तुका ह्मणे यश कीतिऩ आणि मान । करितां जतन देव जोडे ॥3॥ 3172 विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥1॥ तंव जाला साहए हृदयनिवासी । बुिद्ध दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥ उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥2॥ तुका ह्मणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥3॥ 3173 आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुिद्ध तो ॥1॥ विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥ भुलल्यांचें अंग आपण्या पारिखें । छंदा च सारिखें वर्ततसे ॥2॥ तुका ह्मणे दुःख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥3॥ 3174 केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥1॥ होय तैसें होय आतां । देह बळी काय चिंता ॥ध्रु.॥ पडिलें पालवीं। त्याचा धाक वाहे जीवीं ॥2॥ तुका ह्मणे जीणें । देवा काय हीनपणें ॥3॥ 3175 आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौन्य चि॥1॥ नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥ध्रु.॥ वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥2॥ तुका ह्मणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥3॥ 3176 चित्ताचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥1॥ नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥ चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥2॥ तुका ह्मणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी॥3॥ 3177 करितां तडातोडी । वत्सा माते सोइऩ ओढी ॥1॥ करित्याचा आग्रह उरे । एक एकासाटीं झुरे ॥ध्रु.॥ भुके इच्छी अन्न। तें ही त्यासाटीं निर्माण ॥2॥ तुका ह्मणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥3॥ 3178 निघालें दिवाळें । जालें देवाचें वाटोळें ॥1॥ आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥ध्रु.॥ गुंडािळलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥2॥ तुका ह्मणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥3॥ 3179 तीर्थाचिये आस । पंथ तो निट देव । पाविजेतो ठाव अंतराय ॥1॥ ह्मणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥ संकल्पारूढ तें प्रारब्धें चि जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥2॥ तुका ह्मणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥3॥ 3180 क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥1॥ नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥ संतासमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमाथाअ ॥2॥ तुका ह्मणे येह लोकीच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥3॥ 3181 कोणाशीं विचार करावा सेवटीं । एवढएा लाभें तुटी जाल्या तरे ॥1॥ सांभािळतो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥ घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥2॥ तुका ह्मणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाव कार्या येतो ॥3॥ 3182 असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥1॥ आह्मीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥ चिंतन चि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥2॥ तुका ह्मणे देवा । नका नावडे ते सेवा ॥3॥ 3183 अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा ॥1॥ नातळे तो धन्य यासी । जाला वंषीं दीपक ॥ध्रु.॥ करवितो आत्महत्या। नेदी सत्या आतळों ॥2॥ तुका ह्मणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि॥3॥ 3184 इिच्छलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥1॥ क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥ भाग्याविण कैचें फळ ।अंतर मळमूत्राचें ॥2॥ तुका ह्मणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥3॥ 3185 काशासाठीं आह्मी जािळला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥1॥ कैसें नेणों तुह्मां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥ समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥2॥ तुका ह्मणे अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाटीं ॥3॥ 3186 नाहीं तुह्मां कांहीं लाविलें मागणें । कांटाऑयाच्या भेणें त्रासलेती ॥1॥ एखादिये परी टाळावीं करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ध्रु.॥ पायांच्या वियोगें प्राणासवें साटी । ने घवेसी तुटी जाली आतां ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां मागेन तें आतां । हें चि कृपावंता चरणीं वास ॥3॥ 3187 जग अमंगळ । लागे देखतां विटाळ ॥1॥ धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥ध्रु.॥ नव्हे माझें मत । साक्षी करूनि सांगें संत ॥2॥ तुका ह्मणे जीवें । दावी उमटूनि अनुभवें ॥3॥ 3188 दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा॥1॥ नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥ पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥2॥ तुका ह्मणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥3॥ 3189 आह्मी पापी तूं पावन । हें तों पूर्वापार जाण ॥1॥ नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें तेणें ॥ध्रु.॥ राखावा तो ठाव। मिरासी करोनि उपाव ॥2॥ वादें मारी हाका । देवा आइकवी तुका ॥3॥ 3190 पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥1॥ नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥ लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥2॥ तुका ह्मणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥3॥ 3191 भजनें चि जालें । मग जीवाचें काय आलें ॥1॥ येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥ करितां सरोबरी। कांहीं न ठेवावी उरी ॥2॥ तुका ह्मणे शूर । व्हावे धुरेसीं च धुरे॥3॥ 3192 जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥1॥ वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥ पतितपावन िब्रद साच करीं देवा । यालागी कुढावा करीं माझा ॥2॥ अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलों भारी संवसारें ॥3॥ कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें जालें देवा ॥4॥ हा ना तोसा ठाव जाला पांडुरंगा । नये चि उपेगा काय करूं ॥5॥ आपुलिया नांवा धांवणिया धांवें । लवकरी यावें तुका ह्मणे ॥6॥ 3193 प्रेमभेटी आिंळगण । मग चरण वंदावे ॥1॥ ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥ न संगतां सीण भाग। पांडुरंग जाणतसे ॥2॥ तुका ह्मणे कृपावंतें । द्यावें, भातें न मागतां ॥3॥ 3194 वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥1॥ परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥ अश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥2॥ तुका ह्मणे वरावरी । जातों तरी सांगत ॥3॥ 3195 कां रे तुह्मीं ठेवा बहुतां निमित्तें । माझिया संचितें वोडवलें ॥1॥ भिHप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥ पुसिलें पडळ त्रिमिर विठ्ठलें । जग चि भरलें ब्रह्मानंदें ॥2॥ तुका ह्मणे केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळावरी वसे ॥3॥ 3196 आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन॥1॥ अवघियां केली काळें तडातोडी । अवश्वरु घडी पुरों नये ॥ध्रु.॥ वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला॥2॥ आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥3॥ काम तरी क्रोध बुिद्ध मन नासे । भ्रमाचे वोळसे गििळले शांती ॥4॥ तुका ह्मणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥5॥ 3197 ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥1॥ भवव्याधि येणें तुटेल रोकडी । करूनियां झाडी निश्चयेसी ॥ध्रु.॥ आणिकां उपायां अनुपान कठिण । भाग्यें बरें सीण शीघ्रवत ॥2॥ तुका ह्मणे केला उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥3॥ 3198 जपाचें निमित्त झोपेचा पसरु । देहाचा विसरू पाडूनियां॥1॥ ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥ सेवेविशीं केलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥2॥ तुका ह्मणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आह्मी ॥3॥ 3199 परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्ता । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥1॥ ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥ सकट आंबलें तें अन्न । शोधीं तें चि मद्यपान । विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥2॥ तुका ह्मणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय हित । मोलें घ्यावें लागतें ॥3॥ 3200 भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥1॥ कुिळकेसी लांस फांस । डोइऩ दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥ विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तो चित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥2॥ आYाापालणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका ह्मणे ठेवा । ठेविला तो जतन ॥3॥ 3201 कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥1॥ तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥ पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥2॥ तुका ह्मणे मोल । न लगें द्यावें वेचावे बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥3॥ 3202 तरी कां वोळगणे । राजद्वारीं होती सुने ॥1॥ अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥ कासया मोकळ। भोंवतें शिष्यांचे गाबाळ ॥2॥ तुका ह्मणे ढाळे । बाहेर गुदे तें निराळें॥3॥ 3203 हरिच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥1॥ कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥ सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥2॥ तुका ह्मणे समाधान । सदा मन आमुचें ॥3॥ 3204 भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ॥1॥ क्षणक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ध्रु.॥ दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥2॥ तुका ह्मणे जाणे धने । धरी तें वर्म चिंतन ॥3॥ 3205 संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥1॥ कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥ काया कुरवंडी। करुन ओंवाळून सांडी ॥2॥ तुका ह्मणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥3॥ 3206 भेद तुटलियावरी । आह्मी तुमचीं च हो हरी ॥1॥ आतां पाळावे पाळावे । आह्मां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥ आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥2॥ तुका ह्मणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥3॥ 3207 आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥1॥ पुढती पुढती नमन । घालूंनियां लोटांगण ॥ध्रु.॥ हें चि एक जाणें। काया वाचा आणि मनें ॥2॥ नीच जनालोकां । तिळले पायेरीस तुका ॥3॥ 3208 विनवितों सेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥1॥ कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥ पुरली वासना । येणें होइऩल नारायणा ॥2॥ तुका ह्मणे जो देहाडा । तो चि वर्णीन पवाडा ॥3॥ 3209 आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥1॥ ऐसीं उफराटीं वर्में । कळों भ्रमें न येती ॥ध्रु.॥ न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥2॥ तुका ह्मणे एका जीवें । सूत्र व्होवें गुंतलें ॥3॥ 3210 बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥1॥ सुख वसे चित्ता अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥ भक्षी त्याचा जीवमाग। आले भाग तो बरा ॥2॥ तुका ह्मणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळां॥3॥ 3211 शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥1॥ ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥ सांभाळावें वर्म। उचिताच्या काळें धर्म ॥2॥ तुका ह्मणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥3॥ 3212 उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥1॥ पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ।ध्रु.॥ दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥2॥ अळसाची धाडी ॥ तुका ह्मणे बहु नाडी॥3॥ 3213 शHी द्याव्या देवा । नाहीं पदार्थी सेवा ॥1॥ मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥ मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥2॥ तुका ह्मणे सोसें । लागे लाविल्याचें पिसें ॥3॥ 3214 कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण ॥1॥ काय करुनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥ रूपीं नाहीं गोडी । हांवें हांवें ऊर फोडी ॥2॥ तुका ह्मणे पडे भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥3॥ 3215 संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥1॥ हरिभजनें हें धविळलें जग । चुकविला लाग किळकाळाचा ॥ध्रु.॥ कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥2॥ तुका ह्मणे सुख समाधि हरिकथा । नेणें भववेथा गाइऩल तो ॥3॥ 3216 विश्वासिया नाहीं लागत सायास । रंग अनायासें अंगा येतो ॥1॥ लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥ गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥2॥ तुका ह्मणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कइप पक्षी पांडुरंग ॥3॥ 3217 वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अपिऩलें तें ॥1॥ नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥ जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणच ॥2॥ तुका ह्मणे बरें धाकटएाचें जिणें । माता स्तनपानें वाढवते ॥3॥ 3218 कइप ऐसी दशा येइल माझ्या आंगा । चित्त पांडुरंगा झुरतसे ॥1॥ नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥ काय ऐसा पात्र होइऩन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टइऩल ॥2॥ तुका ह्मणे धन्य मानीन संचित । घेइऩन तें नित्य प्रेमसुख ॥3॥ 3219 नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥1॥ आYाा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेसी ॥ध्रु.॥ आळीकरें आह्मी एकविध चित्तें । तैसें होऊं येतें मायबापें ॥2॥ तुका ह्मणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥3॥ 3220 काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥1॥ चित्तासी प्रसाद होइऩल चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥ सर्व शिH जीवीं राहिल्या कुंटित । नाहीं केलें होत आपुलें तें ॥2॥ तुका ह्मणे दोरी खांब सूjया हातीं । नाचवी नाचती जडें तैसीं ॥3॥ 3221 देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥1॥ वाहिलें देह हें देवा एकसरें । होइऩल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥ होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती साटवण ॥2॥ तुका ह्मणे इच्छे पावविले कष्ट । ह्मणऊनि नष्ट दुरावली ॥3॥ 3222 देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥1॥ तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥ शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥3॥ 3223 काय करूं सांगतां ही न कळे वर्म । उपिस्थत भ्रम उपजवितो ॥1॥ मन आधीं ज्याचें आलें होइऩल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥ अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥2॥ तुका ह्मणे आप राखावें आपणा । संकोचों चि कोणा नये आतां ॥3॥ 3224 अमृत अव्हेरें उचळलें जातां । विष आर्त्तभूतां आवश्यक ॥1॥ आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥ ख†याचिये अंगीं आपणे चाली । लावणी लाविली काय लागे ॥2॥ तुका ह्मणे चाडे करा वेवसाव । आह्मांसी तो वाव धीर आहे ॥3॥ 3225 अनुभवाचे रस देऊं आर्त्तभूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥1॥ देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥ आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥2॥ तुका ह्मणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥3॥ 3226 काय मज एवढा भार । हे वेव्हार चाळवाया ॥1॥ उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥ चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥2॥ तुका ह्मणे सेवट झाल । देव या बोला भोगिता ॥3॥ 3227 न गमे न गमे न गमे हरिविण । न मगे न मगे न मगे मेळवा शाम कोणी गे ॥1॥ तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा ओसा वो ॥ध्रु.॥ नाठवे भूक तान विकळ जालें मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥2॥ जरी तुह्मी नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥3॥ 3228 विठ्ठला रे तुझे वणिऩतां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध जालीं पापें ॥1॥ विठ्ठला रे तुझें पाहातां श्रीमुख । विठ्ठला रे सुख जालें नयना ॥ध्रु.॥ विठ्ठला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाहएा ॥2॥ विठ्ठला रे तुझी ऐकतां कीिर्त्त । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥3॥ विठ्ठला रे तुकयाबंधु ह्मणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥4॥ 3229 एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥1॥ घ्यावें द्यावें आह्मीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥ भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां विश्वासाच्या बळें। ठेविलें मोकळें देवें येथें ॥3॥ 3230 स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥1॥ पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥ भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥2॥ तुका ह्मणे कळे । तूं चि धावें ऐसें वेळे॥3॥ 3231 पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥1॥ एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥ पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥2॥ तुका ह्मणे जे जे जाती । तैसी िस्थति येतसे ॥3॥ 3232 कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥1॥ बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ध्रु.॥ घटापटा ढवळी मन। होय सीण न करूं तें ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥3॥ 3233 एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि॥1॥ आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥ बहु दूरवरी भोगविले भोग । आतां पांडुरंगा सोडवावें॥2॥ तुका ह्मणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ॥3॥ 3234 आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥1॥ तूं वो माझी सखी होसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥ काया वाचा मनें हें चि काम करीं । पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥2॥ तुका ह्मणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रह्मरस भोजन हें ॥3॥ 3235 हें आह्मां सकळा । तुझ्या नामाचें चि बळ ॥1॥ करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥ जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥2॥ तुका ह्मणे देवा । तुझे पायीं माझा हेवा॥3॥ 3236 आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावीं भेटी पायांशी ॥1॥ यासी तुह्मी कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ ।ध्रु.॥ तळमळ करी चित्त । अखंडित वियोगें ॥2॥ तुका ह्मणे पंढरिनाथा । जाणें वेथा अंतरिंची ॥3॥ 3237 बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥1॥ आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥ वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥2॥ तुका ह्मणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥3॥ 3238 कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥1॥ सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥ ज्यालें जेऊं नेदी मारिलें चि मरो । प्रारब्धा उरो मागुतालीं ॥2॥ तुका ह्मणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥3॥ 3239 डौरलों भिHसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥1॥ संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥ ब्रह्मादिकांसी सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥2॥ नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥3॥ मुH व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें भेटी॥4॥ तुका ह्मणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥5॥ 3240 फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥1॥ केली हरिनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥ देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥2॥ घ्यावें धणीवरी । तुका ह्मणे लाहान थोरीं ॥3॥ 3241 आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें॥1॥ काय सांगों जालें कांहऴिचयाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥ गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥2॥ तुका ह्मणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥3॥ 3242 ह्मणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥1॥ आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें आह्मास ॥ध्रु.॥ वाढली ते तळमळ चिंता । शम आतां करावी ॥2॥ तुका ह्मणे जीवीं वसे । मज नसे वेगळी ॥3॥ 3243 कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥1॥ आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥ गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरि ॥2॥ तुका ह्मणे गातां गीत । आलें हित सामोरें ॥3॥ 3244 हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार बोल्हावला ॥1॥ तेथें माझ्या मना होइप पिक्षराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥ मुळऴिचया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी जालियाची ॥2॥ तुका ह्मणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥3॥ 3245 बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥1॥ देव आह्मा प्राणसखा । जालें दुःखा खंडण ॥ध्रु. ॥ जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥2॥ तुका ह्मणे निजठेवा । होइऩल हेवा लाधलों ॥3॥ 3246 जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें ॥1॥ कारण केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥ध्रु.॥ समपिऩला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥2॥ तुका ह्मणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥3॥ 3247 पात्र शुद्ध चित्त गोही । न लगे कांहीं सांगणें ॥1॥ शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥ अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥2॥ तुका ह्मणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥3॥ 3248 प्रगटलें Yाान । नारायण भूतीं तें ॥1॥ अनुभव च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥ देखोवेखीं वदे वाणी। पडिल्या कानीं प्रमाणें ॥2॥ तुका ह्मणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥3॥ 3249 मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥1॥ मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥ उदासीन वृित्त देहीं। चाड नाहीं पाळणें ॥2॥ तुका ह्मणे नाहीं भय । सम सोय विषमाची॥3॥ 3250 आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका॥1॥ आवडीनें आवडी उरे । जें ज्या झुरे तें त्यासी ॥ध्रु.॥ प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥2॥ तुका ह्मणे चिंतन बरें । आहे खरें ख†यापें ॥3॥ 3251 केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥1॥ होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेदावी ॥ध्रु.॥ आह्मी तरी जड जीव। कैंचा भाव पुरता ॥2॥ अनन्यभावें घ्यावी सेवा । आह्मां देवा घडेसी ॥3॥ तुह्मीं आह्मी शरणागतें । कृपावंतें रक्षीजे ॥4॥ तुका ह्मणे भाकुं कींव । असों जीव जड आह्मी ॥5॥ 3252 सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥1॥ करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥ पाळी तोंडऴिचया घांसें । तें चि होय अनारिसें । ज्या नव्हे ऐसें । खेदी परि सोडवीना ॥2॥ तुका ह्मणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला जनें । देखों लाभें हा लाभ ॥3॥ 3253 इिच्छती तयांसी व्हावें जी अरूप । आह्मांसी स्वरूपिस्थती चाड ॥1॥ आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥ लेंकरासी कोठें जाणत्याची परी। करूं येते दुरी धरावया ॥2॥ लागली न सुटे नामाची आवडी। माझी भावजोडी भंगूं नका ॥3॥ घेसील वेढे मुHीच्या अभिळासें। चाळवीं जा पिसे ब्रह्मYाानी ॥4॥ तुका ह्मणे माझा कोठें भिHरस। पाडावया ओस चाळविसी ॥5॥ 3254 आह्मां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुिH । सरों शके चि ना ॥1॥ जाणें माउली त्या खुणा। क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना ॥लावीं अवो कृपाळे॥ध्रु.॥ तुज अवघे होऊं येते । मज वाटों नये चित्ते । उपासने परतें। नये कांहीं आवडों ॥2॥ करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम उच्चारणा। तुका ह्मणे जना । जल स्थल देखतां ॥3॥ 3255 ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥1॥ प्रारब्धीं संसार । बरी हिमतीची थार ॥ध्रु.॥ होणार ते कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥2॥ तुका ह्मणे देवें । कृपा केलिया बरवें ॥3॥ 3256 किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस जालेती ॥1॥ माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥ कांहीं न मागतां भलें । होइऩल तें चि काम केलें । नसावें आथिलें। कांहीं एका संकल्पें ॥2॥ तुका ह्मणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥3॥ 3257 बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनी ॥1॥ एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥ लेवऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥2॥ तुका ह्मणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥3॥ 3258 या रे हरिदासानो जिंकों किळकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥1॥ रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें मनाचिये आवडी ॥ध्रु.॥ येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥2॥ वांकडएा माना बोल बोलावे आर्ष । येइऩल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥3॥ आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥4॥ तुका ह्मणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भH दोन्ही निवडितां पातक॥5॥ 3259 अवघा च अन्यायी । तेथें एकल्याचें काइऩ ॥1॥ आतां अवघें एकवेळें । जळोनि सरो तें निराळें ॥ध्रु.॥ काय माझें खरें । एवढें च राखों बरें ॥2॥ तुका ह्मणे आतां । परिहार न लगे चित्ता ॥3॥ 3260 काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥1॥ तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥ न कळे विंचासी कुरवािळलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥2॥ तुका ह्मणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥3॥ 3261 स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥1॥ नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥ जीव ज्याचें दान। त्याचा खंडूनियां मान ॥2॥ तुका ह्मणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥3॥ 3262 संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥1॥ ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥ घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥2॥ तुका ह्मणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम॥3॥ 3263 अवो कृपावंता । होइप बुद्धीचा ये दाता ॥1॥ जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥ वदवीं हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥2॥ तुका ह्मणे देवा । माझे अंतर वसवा ॥3॥ 3264 नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥1॥ विटेवरी भाव ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥ पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥2॥ तुका ह्मणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥3॥ 3265 चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥1॥ सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्तीं भ्रम गाढा ॥ध्रु.॥ रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥2॥ तुका ह्मणे भय धरी रज्जूसाटीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥3॥ 3266 आवडी येते कळों । गुणें चिन्हें उमटती ॥1॥ पोटीचें ओठीं उभें राहे । चित्त साहे मनासी ॥ध्रु.॥ डाहोळे याची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥2॥ तुका ह्मणे मानोन घ्यावें । वाटे खावें वाटतें ॥3॥ 3267. काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥1॥ आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥ पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥2॥ तुका ह्मणे कानीं । घालूं आले दुष्टवाणी॥3॥ 3268 किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥1॥ ह्मणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥ प्रारब्ध पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥2॥ तुका ह्मणे रोकडीं हे । होती पाहें फजीती ॥3॥ 3269 होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥1॥ तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥ होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥2॥ तुका ह्मणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥3॥ 3270 भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥1॥ काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥ मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥2॥ तुका ह्मणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥3॥ 3271 जा रे तुह्मी पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥1॥ गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥ उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥2॥ तुका ह्मणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड॥3॥ 3272 गर्जत जावें नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥1॥ येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळा ॥ध्रु.॥ लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥2॥ तुका ह्मणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥3॥ 3273 अनुसरे तो अमर जाला । अंतरला संसारा ॥1॥ न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥ विसंभेना माता बाळा। तैसा लळा पाळावा ॥2॥ त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तुक्या रिक्षता तो जाला ॥3॥ 3274 आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥1॥ देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥ काळाचें खंडण घडावें चिंतन । धनमानजनविन्मुख तो ॥2॥ कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं॥3॥ सावध तों माझीं इंिद्रयें सकळें । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥4॥ तुका ह्मणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐकता सकळांसी ॥5॥ 3275 चित्त तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंिद्रयांची ॥1॥ हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥ रवीचिये अंगीं प्रकाशक कळा । वचनें निराळा भेद दिला ॥2॥ तुका ह्मणे माप वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगीं निवडावें ॥3॥ 3276 बोलोनियां काय दावूं । तुह्मी जीऊ जगाचे ॥1॥ हे चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥ विरHासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥2॥ तुका ह्मणे पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥3॥ 3277 निजों नव्हें सकाळवेळीं । रातीकाळी चिंन चिंनी॥1॥ वोंगळानें घेतली पाठी । केली आटी जीवासी ॥ध्रु.॥ मेळऊनि सवें जन । चिंता नेणे देवळीं च ॥2॥ तुका ह्मणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥3॥ 3278 मायबाप सवें नये धनवित्त । करावें संचित भोगावें तें ॥1॥ ह्मणऊनि लाभ काय तो विचारीं । नको चालीवरी चित्त ठेवूं ॥ध्रु.॥ आयुष्य सेवटीं सांडूनि जाणार । नव्हे हें साचार शरीर हें ॥2॥ तुका ह्मणे काळें लावियेलें माप । जमे धरी पापपुण्याची ही ॥3॥ 3279 मोटळें हाटीं सोडिल्या गांठी । विक†या घातलें केण। ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिलें । सारूनि लिगाड दान । खरें माप हातीं घेऊनि बैसलों । मानिती ते चौघे जन । खरें वित्त तेथें आले चोजवीत । गि†हाइक संतजन ॥1॥ झाडिला पालव केला हाट वेच । जाली सकाळीं च अराणूक । याल तरि तुह्मी करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ध्रु.॥ एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन । बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण । लाभ हाणि कोणा मुदल जालें । कोणासी पडिलें खाण । अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥2॥ एके सांते आले एक गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें । येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें । लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ॠणें । तुका ह्मणे आतां पाहूं नये वास। साधावें आपुलें पेणें ॥3॥ 3280 करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥1॥ दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा ह्मणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥ होती गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमाना काळीं । हातपायटाळीं । जें मोकळी आहेती ॥2॥ कां रे घेतलासी सोसें । तुज वाटताहे कैसें। तुका ह्मणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥3॥ 3281 यत्न आतां तुह्मी करा । मज दातारा सत्तेनें ॥1॥ विश्वास तो पायांवरि । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥ जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥2॥ तुका ह्मणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥3॥ 3282 अनाथां जीवन । आह्मां तुमचे चरण । करूनि सांटवण। धरीयेले हृदयीं ॥1॥ पुष्ट जाली अंगकांति । आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥ करुणाउत्तरीं। करून आळवण हरी । जाऊं नेदूं दुरी । प्रेमप्रीतिपडिभरें ॥2॥ मोहो माते करी गोवा । ऐसें आहे जी केशवा । तुका ह्मणे सेवा । आणीक नाहीं जाणत ॥3॥ 3283 सुखाची वसति जाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥1॥ रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥ विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा ॥ गोडावली वाचा येणें रसें ॥2॥ तुका ह्मणे कांहीं नाठवेसें केलें । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥3॥ 3284 आह्मां कांहीं आह्मां कांहीं । आतां नाहीं या बोलें॥1॥ मोल सांगा मोल सांगा । घेणें तिंहीं गा पुसावें ॥ध्रु.॥ कैसें घडे कैसें घडे । बडबड तुज मज ॥2॥ मुदलें साटी मुदलें साटी । लाभ पोटीं त्या च मधीं ॥3॥ तुका ह्मणे साटवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥4॥ 3285 घ्या रे भाइऩ प्या रे भाइऩ । कोणी कांहीं थोडें बहु॥1॥ ये च हाटीं ये च हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥ वेच आहे वेच आहे । सरलें पाहे मग खोटें ॥2॥ उघडें दुकान उघडें दुकान । रात्री जाली कोण सोडी मग ॥3॥ तुका ह्मणे अंतकाळीं । जाती टाळीं बैसोनि ॥4॥ 3286 मार्ग चुकले विदेशीं एकले । तयावरि जाले दिशाभुली॥1॥ हातीं धरूनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥2॥ तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा ह्मणऊनि ॥ध्रु.॥ सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभािळली भूमि शुद्ध ॥3॥ उष्ण तान भूक एवढिये अकांतीं । वोसंगा लाविती काय ह्मणिजे ॥4॥ खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे। अन्याय हि मोटे साच केले ॥5॥ हातींचें हिरोनि घातला पाठीसी। तुका ह्मणे ऐसी परी जाली ॥6॥ 3287 जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥1॥ लेकरांच्या स्नेहें गोड । करी कोड त्या गुणें ॥ध्रु.॥ मागें पुढें रिघे पोटीं । साहे खेटी करीतें ॥2॥ तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥3॥ 3288 गुणांचे आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरु इतरांचा ॥1॥ आदिमध्यअंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळोनि गेलें ॥ध्रु.॥ रामकृष्णनाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥2॥ तुका ह्मणे तनु जालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रह्मानंदें ॥3॥ 3289 देवाची भांडारी । आदा विनियोग करी ॥1॥ आतां न माखे हातपाय । नेणों होतें ऐसें काय ॥ध्रु.॥ देवें नेली चिंता । जाला सकळ करिता ॥2॥ तुका ह्मणे धणी । त्यासी अवघी पुरवणी ॥3॥ 3290 पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥1॥ तैसी माझ्या मना परी जाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥ कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥2॥ तुका ह्मणे जालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥3॥ 3291 जालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक ही देवा न लगे दुजें ॥1॥ प्रारब्धा अंगीं अन्न आच्छादन । िस्थर करोनि मन ठेवीं पायीं ॥ध्रु.॥ ये गा ये गा ये गा कृपाळुवा हरी । निववीं अभ्यंतरीं देउनि भेटी ॥2॥ आसावलें मन जीवनाचे ओढी । नामरूपें गोडी लावियेली ॥3॥ काय तुह्मांपाशीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥4॥ काय लोखंडाचे पाहे गुण दोष । सिवोनि परिस सोनें करी ॥5॥ तुका ह्मणे माझें अवघें असों द्यावें। आपुलें करावें ब्रीद साच ॥6॥ 3292 येथें आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि जालें ॥1॥ गाऊं नाचों टाळी गाऊं गाऊं गीत छंदें । डोलवूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥ मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी निवडिली ॥2॥ तुका ह्मणे जगा लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥3॥ 3293 शरणागत जालों । तेणें मीपणा मुकलों ॥1॥ आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥ नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥2॥ तुका ह्मणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥3॥ 3294 वाचेचिया आळा कविळलें ब्रह्म । चुकविला श्रम पृथक तो ॥1॥ सुलभ जालें सुलभ जालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥ नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥2॥ तुका ह्मणे वाटे चुकली वसती । उद्धार तो हातीं आणियेला ॥3॥ 3295 सवंग जालें सवंग जालें । घरा आलें बंदरींचे ॥1॥ आतां हेवा करावा सोस । भिHरस बहु गोड ॥ध्रु.॥ पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥2॥ तुका ह्मणे संचिताचें । नेणें काचें राहों तें ॥3॥ 3296 तुह्मी संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥1॥ अवतार तुह्मां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव॥ध्रु.॥ वाढविलें सुख भिH भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥2॥ तुका ह्मणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुह्मी जगीं संतजन ॥3॥ 3297 पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥1॥ येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तइप छो ह्मणा ॥ध्रु.॥ पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥2॥ तुका ह्मणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥3॥ 3298 सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां॥1॥ तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पािळलों ॥ध्रु.॥ आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥2॥ तुका ह्मणे आलें वारी । दुरितें दुरी नातळतां ॥3॥ 3299 सुनियांचा हा चि भाव । आपला ठाव राखावा ॥1॥ दुजियाचा येऊं वारा । नेदूं घरावरी देऊं ॥ध्रु.॥ केली याची फाडाफाडी। तडामोडी क्षेत्राची ॥2॥ पातेजत नाहीं लोकां । तुका देवावांचूनि॥3॥ 3300 सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥1॥ सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥ नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥2॥ तुका ह्मणे कृवािळतां । अंग सत्ता संगाची ॥3॥ [[वर्ग:गाथा]] rteztxrhu5ebsfkq4zezyc0hqlz0ltk तुकाराम गाथा/ ३३०१ ते ३६०० 0 1544 36906 36884 2026-09-19T19:41:51Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36906 wikitext text/x-wiki 3301 सिळें खातां आला वीट । सुनें धीट पावि धरी॥1॥ कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥ आपुलिये ठायींचे घ्यावें । लाड भावें पाळावा ॥2॥ तुका ह्मणे मी जुनाट । मोहो आट परतला ॥3॥ 3302 लागलें भरतें । ब्रह्मानंदाचें वरतें ॥1॥ जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ध्रु.॥ बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥2॥ तुका ह्मणे वाट । बरवी सांपडली नीट ॥3॥ 3303 धनें वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥1॥ ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥ अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥2॥ तुका ह्मणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त॥3॥ 3304 बोलावें तें आतां आह्मी अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥1॥ मेघदृिष्ट कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळो ॥2॥ तुका ह्मणे नाहीं समाधानें चाड । आपणा ही नाड पुढिलांसीं ॥3॥ 3305 अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥1॥ मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥2॥ तुका ह्मणे फांसे वाघुरा कु†हाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ॥3॥ 3306 नव्हों वैद्य आह्मी अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥1॥ कुपथ्य करूनि विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥2॥ तुका ह्मणे लांसू फांसंू देऊं डाव । सुखाचा उपाव पुढें आहे ॥3॥ 3307 नव्हें परि ह्मणवीं दास । कांहीं निमित्तास मूळ केलें॥1॥ तुमचा तो धर्म कोण । हा आपण विचारा ॥धृ. ॥ नाहीं शुद्ध आचरण । परी चरण चिंतितों ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । ऐसें कां गा नेणां हें ॥3॥ 3308 मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥1॥ तुह्मी आह्मां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥ मोहजाळें दुःख वाढे । ओढे ओढे त्यास तें ॥2॥ तुका ह्मणे कोण देवा । आतां हेवा वाढवी ॥3॥ 3309 आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥1॥ निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥ संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥2॥ तुका ह्मणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥3॥ 3310 असो खटपट । आतां वाउगे बोभाट ॥1॥ परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥ अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥2॥ तुका ह्मणे वेथा । तुह्मा कळे पंढरिनाथा ॥3॥ 3311 वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥1॥ काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ध्रु.॥ चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥2॥ तुका ह्मणे संसारा । रुसलों खरा यासाठीं ॥3॥ 3312 जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा ॥1॥ वाढवावें हें उत्तर । कांहीं लाज करकर ॥ध्रु.॥ कोठें वांयां गेले । शब्द उत्तम चांगले ॥2॥ तुका ह्मणे बाळा । असतात िप्रय खेळा॥3॥ 3313 वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग ॥1॥ काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ध्रु.॥ पोटा आलें बाळ। त्याचें जाणावें सकळ ॥2॥ चुका ह्मणे हरी । वाहावें जी कडियेवरी॥3॥ 3314 सेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥1॥ ऐसे करा कृपादान । तुह्मां मन सन्निध ॥ध्रु.॥ भाग्याविण कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥2॥ तुका ह्मणे कळसा आलें । हें विठ्ठलें परिसावें ॥3॥ 3315 करूंनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥1॥ तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥ध्रु.॥ तेथे सरे शुद्ध साचें । अंतरींचे बीज तें ॥2॥ तुका ह्मणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥3॥ 3316 जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं ॥1॥ काय केलों एकदेशी । गुणदोषीं संपन्न ॥ध्रु.॥ पडें तेथें तुझ्या पायां। करीं वायां न वजतें ॥2॥ तुका ह्मणे विषमें सारी । ठाणें धरी जीवासी ॥3॥ 3317 जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावें यावरी ॥1॥ माझ्या अवघ्या भांडवला । तूं एकला जालासी ॥ध्रु.॥ आतां दुजें धरा झणी । पायांहूनि वेगळें ॥2॥ तुका ह्मणे आतां देवा । नका गोवा यावरी ॥3॥ 3318 स्मरतां कां घडे नास । विष्णुदास यावरी ॥1॥ ऐसी सीमा जाली जगीं । तरी मी वेगीं अनुसरलों ॥ध्रु.॥ धरिलें तें निवडे आतां । न घडे चित्तावेगळें ॥2॥ तुका ह्मणे नाश नाहीं । पुराणें ही गर्जती ॥3॥ 3319 आधी नाहीं कळों आला हा उपाय । नाहीं तरी काय चुकी होती ॥1॥ घालितो पायांसी मिठी एकसरें । नेदीं तो दुसरें आड येऊं ॥ध्रु.॥ कासया पडतों लटिक्याचे भरी । नव्हता का शिरीं भार घेतों ॥2॥ तुका ह्मणे कां हे घेतों गर्भवास । कां या होतों दास कुटुंबाचा ॥3॥ 3320 आतां बरें जालें । माझें मज कळो आलें ॥1॥ खोटा ऐसा संवसार । मज पायीं द्यावी थार ॥ध्रु.॥ उघडले डोळे । भोग देताकाळीं कळे ॥ तुका ह्मणे जीवा । होतां तडातोडी देवा ॥3॥ 3321 बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥1॥ सर्व सििद्ध पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥ संतसमागमें अळंकार वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजा ॥2॥ तुका ह्मणे रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओऊं ॥3॥ 3322 परिसाचे अंगें सोनें जाला विळा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥1॥ अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥ पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग॥2॥ तुका ह्मणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें॥3॥ 3323 ज्याचे माथां जो जो भार । ते चि फार तयासी ॥1॥ मागें पुढें अवघें रितें । कळों येतें अनुभवें ॥ध्रु.॥ परिसा अंगीं अमुपसोनें । पोटीं हीन धातु चि ॥2॥ आपुला तो करि धर्म । जाणे वर्म तुका तें ॥3॥ 3324 पाहें तिकडे दिशा ओस । अवघी पास पायांपें ॥1॥ मन चि साच होइल कइप । प्रेम देइप भेटोनि ॥ध्रु.॥ सर्वापरि पांगुळ असें । न कळे कैंसे तें तुह्मा ॥2॥ तुका ह्मणे कृपावंता । तूं तों दाता दीनाचा ॥3॥ 3325 चालवणें काय । ऐसें अंगे माझे माय ॥1॥ धांव धांव लवलाहें । कंठीं प्राण वाट पाहे ॥ध्रु.॥ पसरूनि कर । तुज चालिलों समोर ॥2॥ देसील विसांवा । तुका ह्मणे ऐशा हांवा॥3॥ 3326 आवडीच्या ऐसें जालें । मुखा आलें हरिनाम ॥1॥ आतां घेऊं धणीवरि । मागें उरी नुरेतों ॥ध्रु.॥ सांटवण मनाऐसी । पुढें रासी अमुप ॥2॥ तुका ह्मणे कारण जालें । विठ्ठल तीं अक्षरीं॥3॥ 3327 त्यांचिया चरणां माझें दंडवत । ज्यांचें धनवित्त पांडुरंग ॥1॥ येथें माझा जीव पावला विसांवा । ह्मणऊनि हांवा भरलासें ॥ध्रु.॥ चरणींचें रज लावीन कपाळा । जीं पदें राउळा सोइऩ जाती ॥2॥ आणिक तीं भाग्यें येथें कुरवंडी । करूनियां सांडीं इंद्राऐसी ॥3॥ वैष्णवांचे घरीं देवाची वसति । विश्वास हा चित्तीं सत्यभावें ॥3॥ तुका ह्मणे सखे हरिचे ते दास । आतां पुढें आस नाहीं दुजें ॥5॥ 3328 उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें ॥1॥ नाहीं आवडीसी पार । न ह्मणावें जालें फार ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥2॥ तुका ह्मणे पचे । विठ्ठल हें मुखा साचें॥3॥ 3329 सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥1॥ सांभाळीं आपुली हाक देतो माया । आह्मांसी कां भयाभीत केलें ॥ध्रु.॥ रूप नाहीं त्यासी ठेवियेलें नाम। लटका चि श्रम वाढविला ॥2॥ तुका ह्मणे कां गा जालासी चतुर । होतासी निसुर निविऩकार ॥3॥ 3330 अमच्या कपाळें तुज ऐसी बुिद्ध । धरावी ते शुद्धी योगा नये ॥1॥ काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आह्मां ॥ध्रु.॥ कोठें मूिर्त्तमंत दावीं पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥2॥ तुका ह्मणे आतां आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥3॥ 3331 नो बोलावें ऐसें जनासी उत्तर । करितों विचार बहु वेळा ॥1॥ कोण पाप आड ठाकतें येऊन । पालटिति गुण अंतरींचा ॥ध्रु.॥ संसारा हातीं सोडवूनि गळा । हें कां अवकळा येती पुढें ॥2॥ तुका ह्मणे सेवे घडेल अंतराय । यास करूं काय पांडुरंगा ॥3॥ 3332 आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं ॥1॥ मग हे तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येइल ठाया ॥ध्रु.॥ वाउगे वाणीचा न धरीं कांटाळा । ऐसी कां चांडाळा बुिद्ध मज ॥2॥ तुका ह्मणे जरि माथां बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढें ॥3॥ 3333 मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥1॥ अपराध माझे न मनावे मनीं । तुह्मी संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥ आरुष वचन लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥2॥ तुका ह्मणे अंगीं काय नाहीं सत्ता । परि निष्ठ‍ता उपेजना ॥3॥ 3334 कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा ॥1॥ ऐसी काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥ दावी वैकुंठींच्या वाटा । पाहातां मोठा संपन्न। अभिमान तो नाहीं अंगी । भHालागी न बैसे ॥2॥ तुका ह्मणे आळस निद्रा । नाहीं थारा त्या अंगीं । आलें द्यावें भलत्या काळें । विठ्ठल बळें आगळा ॥3॥ 3335 सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचे । त्यांसी कैचा संसार ॥1॥ दोष पळाले दोष पळाले। पैल आले हरिदास ॥ध्रु.॥ प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगीं नाचती । गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥2॥ तुका ह्मणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा । दुर्बळा या शिHहीना । त्या ही जना पुरता ॥3॥ 3336 ऐसीं ठावीं वर्में । तरी सांडवलों भ्रमें ॥1॥ सुखें नाचतों कीर्तनीं । नाहीं आशंकित मनीं ॥ध्रु.॥ ऐसें आलें हाता । बळ तरी गेली चिंता ॥2॥ सुखे येथें जालें तरी । नाहीं आणिकांची उरी ॥3॥ ऐसें केलें देवें । पुढें कांहीं चि न व्हावें ॥4॥ तुका ह्मणे मन । आतां जालें समाधान ॥5॥ 3337 चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥1॥ न लगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ध्रु.॥ हरपला द्वैतभाव । तेणें देह जाला वाव ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे आम्ही । जालों निष्काम ये कामीं ॥3॥ 3338 व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंत ॥1॥ ऐसें गोविंदें गोविलें । बोलें न वजाये बोलिले ॥ध्रु.॥ संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥3॥ 3339 तुह्मांआह्मांसी दरुषण । जालें दुर्लभ भाषण ॥1॥ ह्मणऊनि करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥ध्रु.॥ भविष्याचें माथां देह । कोण जाणें होइल काय ॥2॥ ह्मणे तुकयाचा बंधव । आमचा तो जाला भाव ॥3॥ 3340 अनंतजन्में जरी केल्या तपरासी । तरी हा न पवे ह्मणे देह ॥1॥ ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती भाग्यहीना ॥ध्रु.॥ उत्तमाचें सार वेदाचें भांडार । ज्याच्यानें पवित्र तीथॉ होती ॥2॥ तुका ह्मणे तुकयाबंधु आणीक उपमा । नाहीं या तों जन्मा द्यावयासी ॥3॥ 3341 आह्मांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराइऩ जाणींव न लगे कळा ॥1॥ सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥2॥ तुका ह्मणे कर्मधर्में नये हातां । तयावरि सत्ता भाविकांची ॥3॥ 3342 प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥1॥ काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ध्रु.॥ पदरीं घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥2॥ बोले मना आलें । तुका साहिला विठ्ठलें ॥3॥ 3343 आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती ॥1॥ बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥ध्रु.॥ तळणे कांहीं साम्या पुरे । हें तों नुरे ये रुचि ॥2॥ तुका ह्मणे बरवें जालें । फावलें हें कळे त्या ॥3॥ 3344 केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥1॥ माझी बुिद्ध िस्थर देवा । नाहीं विषयांचा हेवा ॥ध्रु.॥ भावा अंतराय । येती अंतरती पाय ॥2॥ तुका ह्मणे जोडी । आदीं अंतीं राहो गोडी॥3॥ 3345 माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें ॥1॥ मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी॥ध्रु.॥ बाळक धांवोनि आड निघे स्तनीं ॥ घालावा जननी कृपे पान्हां ॥2॥ तुका ह्मणे करीं कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥3॥ 3346 वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥1॥ ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा॥ध्रु.॥ विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवें नव्हे नास ॥2॥ तुका ह्मणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥3॥ 3347 अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें॥1॥ तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । हित तें चि वेगें करूनि घेइप ॥ध्रु.॥ बहुरूपी रूपें नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥2॥ पाषाणाचें नाव ठेविलें देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥3॥ कनक झाड ह्म‍ वंदिलें माथां । परिं तें अर्था न मिळे माजी ॥4॥ तुका ह्मणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावीं नास तो चि पावे ॥5॥ 3348 मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥1॥ धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥ मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥2॥ न दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणे मागें ॥3॥ तुका ह्मणे देखोनियां काइऩ । पांडुरंगा पायीं राखियेलें ॥4॥ 3349 मतिविण काय वणूप तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥1॥ करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥ सुखाचें ओतिलें पाहों ते श्रीमुख । तेणें हरे भूक तान माझी ॥2॥ रसना गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥3॥ तुका ह्मणे माझी दृिष्ट चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाचीं ॥4॥ 3350 ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥1॥ भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा॥ध्रु.॥ अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥2॥ एकला निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥3॥ तुका ह्मणे वाट दावूनि सद्ग‍ु । राहि हा दुरू पांडुरंग ॥4॥ 3351 उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेलें । नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें॥1॥ काय बडिवार सांगसी वांयां । ठावा पंढरिराया आहेसि आह्मां । एकला चि जरी देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥ध्रु.॥ कर्णाऐसा वीर उदार जुंझार । तो तुवां जर्जर केला वाणीं । पडिला भूमी परी नयेची करुणा । दांत पाडियेले दोन्ही ॥2॥ िश्रयाळ बापुडे साित्वकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर । ऐसा कठिण कोण होइऩल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥3॥ सिभ्री चक्रवर्ती करितां यYायाग । त्याचें चिरिलें अंग ठायीं ठायीं । जाचऊनि प्राण घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥4॥ बळीचा अन्याय सांग होता काय। बुडविला तो पाय देऊनि माथां । कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्त कथा ॥5॥ हरिश्चंद्राचें राज्य घेऊनियां सर्व। विकविला जीव डोंबाघरीं । पाडिला विघड नळा दमयंतीमधीं। ऐसी तुझी बुिद्ध हरि ॥6॥ आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपित्त माउसीच्या । वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । ह्मणे बंधु तुकयाचा ॥7॥ 3352 जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥1॥ काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पािळयेलें ॥ध्रु.॥ आभास ही नाहीं स्वप्नीं दुिश्चता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥2॥ आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भH ऐसे जगामाजी जाले ॥3॥ तुका ह्मणे आतां नाहीं भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥4॥ 3353 समश्रुिळत असतां वाचा । घोष न करिसी कां नामाचा ॥1॥ कां रे वैष्णव नव्हेसी । कवण्या दंभें नागवलासी॥ध्रु.॥ हरि हरि ह्मणतां लाजसी । गर्वें फुगोनि चालसी ॥2॥ तारुण्यें उताणा । पुंसेंविण बांडा सुना ॥3॥ जालेंसि महिमेचे वेडें । नाचों लाजसी दिंडीपुढें ॥4॥ अळंकारांच्यानि बळें । वंचलासी तुळसीमाळें॥5॥ कैसा सकुमार जालासी । ह्मणसी न टकें एकादशी॥6॥ स्नान न करिसी आंघोळी । विभुती न लाविसी कपाळीं ॥7॥ वरिवरि न्याहािळसी त्वचा । उपेग नाहीं मांसाचा॥8॥ पद्मनाभी विश्वनाथ । तुका अझून रडत ॥9॥ 3354 वाघाचा काळभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥1॥ बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥ सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युिH कांहीं ॥2॥ तुका ह्मणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥3॥ 3355 सिंदळीचे सोर चोराची दया । तो ही जाणा तया संवसर्गी ॥1॥ फुकासाटीं भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥ सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष अमृताचें ॥2॥ तुका ह्मणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥3॥ 3356 तेणें सुखें माझें निवालें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥1॥ कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥ मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची समूळ गेली ॥2॥ तुका ह्मणे सुख जालें माझ्या जीवा । रंगलें केशवा तुझ्या रंगे ॥3॥ 3357 विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥1॥ सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥ माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकिळकांसी ॥2॥ संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥3॥ माझिये माहेरीं सुखा काय उणें। न लगे येणें जाणें तुका ह्मणे ॥4॥ 3358 ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आणीक न करीं काम जिव्हामुखें ॥1॥ पाहिन तुझे पाय ठेविन तेथें डोय । पृथक तें काय न करीं मनीं ॥ध्रु.॥ तुझे चि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥2॥ करिन सेवा करीं चालेन मी पायीं । आणीक न वजें ठायीं तुजविण ॥3॥ तुका ह्मणे जीव ठेविला तुझ्या पायीं । आणीक तो काइऩ देऊं कोणा ॥4॥ 3359 देवाचें भजन कां रे न करीसी । अखंड हव्यासीं पीडतोसी ॥1॥ देवासी शरण कां रे न वजवे तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागीं ॥ध्रु.॥ देवाचा विश्वास कां रे नाहीं तैसा । पुत्रस्नेहें जैसा गुंतलासी ॥2॥ कां रे नाहीं तैसी देवाची हे गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥3॥ कां रे नाहीं तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार पितृपूजना ॥4॥ कां रे भय वाहासी लोकांचा धाक । विसरोनि एक नारायण ॥5॥ तुका ह्मणे कां रे घातलें वांयां। अवघें आयुष्य जाया भिHविण ॥6॥ 3360 माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥1॥ चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥ करीं त्रिमिराचा नाश । दीप होउनि प्रकाश । तोडीं आशापाश। करीं वास हृदयीं ॥2॥ पाहें गुंतलों नेणतां । तुज असो माझी चिंता। तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥3॥ 3361 आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥1॥ भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥ जेणें काळें उठी मनाची आवडी । ते चि मागों घडी आवडे तें ॥2॥ दुःख येऊं नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥3॥ तुका ह्मणे नाहीं मुHीसवें चाड । हें चि आह्मां गोड जन्म घेतां ॥4॥ 3362 मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहऴिवरहित जो ॥1॥ राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥ नवल काइऩ तरी पाचारितां पावे । न श्मरित धांवे भिHकाजें ॥2॥ सर्व भार माझा त्यासी आहें चिंता । तों चि माझा दाता स्वहिताचा ॥3॥ तुका ह्मणे त्यास गाइऩन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥4॥ 3363 यासी कोणी ह्मणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तो चि एक ॥1॥ आड वाटे जातां लावी नीट सोइऩ । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥ नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥2॥ जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥3॥ तुका ह्मणे निंब दिलियावांचून । अंतरींचा सीण कैसा जाय ॥4॥ 3364 निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥1॥ न पाहिजे जाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥ संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबणा वेंग पडियाली ॥2॥ तुका ह्मणे वर्म नेणतां जें रांधी । पाववी ते बुिद्ध अवकळा ॥3॥ 3365 न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥1॥ माझ्या उपकारासाटीं । वागविला ह्मुण कंठीं ॥ध्रु.॥ घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥2॥ तुका ह्मणे एके ठायीं । कोठें माझें तुझें नाहीं ॥3॥ 3366. नाहीं लाग माग । न देखेंसें केलें जग ॥1॥ आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥ निवारिलें भय । नाहीं दुस†याची सोय ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं॥3॥ 3367 दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेंटािळल्या गुणें धांव घेती ॥1॥ काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥ इंिद्रयांचे भार फिरतील चोर । खान घ्यावया घर फोडूं पाहे ॥2॥ माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥3॥ तुका ह्मणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥4॥ 3368 तुझा दास मज ह्मणती अंकित । अवघे सकिळक लहान थोर ॥1॥ हें चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥ होउनी निर्भर राहिलों नििंश्चतें । पावनपतित नाम तुझें ॥2॥ करितां तुज होय डोंगराची राइऩ । न लगतां कांहीं पात्या पातें ॥3॥ तुका ह्मणे तुज काय ते आशंका । तारितां मशका मज दीना ॥4॥ 3369 काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं॥1॥ जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें॥ध्रु.॥ जरी मागों ध्रुवपद । तरी त्यासी येथील छंद ॥2॥ स्वर्गभोग मागों पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणें ॥3॥ आयुष्य मागों चिरंजीव । जीवा मरण नाहीं स्वभावें ॥4॥ तुका ह्मणे एक मागें । एकपणे नाहीं भंग ॥5॥ 3370 आह्मी ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥1॥ तो हा देवांचा ही देव । काय किळकाळाचा भेव ॥ध्रु.॥ वेद जया गाती। श्रुति ह्मणती नेति नेति ॥2॥ तुका ह्मणे निज । रूपडें हें तkवबीज ॥3॥ 3371 भHवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात॥1॥ तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥ गर्भवास धरी। अंबॠषीचा कैवारी ॥2॥ सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥3॥ तुका ह्मणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी॥4॥ 3372 फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥1॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भH । करवितो घात आणिका जीवा ॥2॥ तुका ह्मणे अवघें फटकाळ हें जन । अनुभविये खूण जाणतील ॥3॥ 3373 लावुनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देउनियां मिठी । पळे महिमा थुलिया ॥1॥ पुढें तो चि करी आड । तिचा लोभ तिसी नाड । लावुनि चरफड । हात गोऊनि पळावें ॥ध्रु.॥ आधीं काकुलती । मोहो घालावा पुढती । तोंडीं पडे माती । फिरतां मागें कैचा तो ॥2॥ तुका ह्मणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे सेवा । सुखें तुह्मां नापिऩती ॥3॥ 3374 नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥1॥ करीं याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥ भेटावें पंढरिराया। हें चि इिच्छताती बाहएा ॥2॥ ह्मणतों जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान चरणासी ॥3॥ चित्त ह्मणे पायीं तुझे राहीन निश्चयीं ॥4॥ ह्मणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं साचा ॥5॥ 3375 मन उताविळ । जालें न राहे निश्चळ ॥1॥ दे रे भेटी पंढरिराया । उभारोनि चारी बाहएा ॥ध्रु.॥ सर्वांग तळमळी । हात पाय रोमावळी ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे कान्हा । भूक लागली नयना॥3॥ 3376 ह्मणसी दावीन अवस्था । तैसें नको रे अनंता ॥1॥ होऊनियां सहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥ध्रु.॥ मृगजळाचिया परी। तैसें न करावें हरी ॥2॥ तुकयाबंधु ह्मणे हरी । कामा नये बाहएात्कारी ॥3॥ 3377 आकारवंत मूतिऩ । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥1॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥ श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥2॥ ह्मणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥3॥ 3378 जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आह्मी ॥1॥ नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥ अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणासी ॥2॥ धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें तें ॥3॥ अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥4॥ तुका ह्मणे आह्मी असोनिया जना । तुज देव पणा आणियेलें ॥5॥ 3379 सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें ॥1॥ ह्मणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥ न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥2॥ तुका ह्मणे निवे तनु । रजकणु लागती ॥3॥ 3380 देऊं कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥1॥ काय होइऩल तें शिरीं । आYाा धरोनियां करीं ॥ध्रु.॥ करूं कळे ऐसी मात। किंवा राखावा एकांत ॥2॥ तुका ह्मणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥3॥ 3381 मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥1॥ सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां ॥ध्रु.॥ आणिकांची चाले सत्ता आह्मांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥2॥ तुका ह्मणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करूं नये ॥3॥ 3382 माझ्या मुखें मज बोलवितो हरि । सकळां अंतरीं नारायण ॥1॥ न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आह्मी ॥2॥ तुका ह्मणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥3॥ 3383 मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला॥1॥ कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥ पुढिलांसाटीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥2॥ तुका ह्मणे कुटिती हाडें। आपुल्या नाडें रडती ॥3॥ 3384 तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेिक्षलें ॥1॥ तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥ अंक तो पडिला हरिचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुह्मां अंगीं ॥3॥ 3385 आह्मां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥1॥ शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥2॥ तुका ह्मणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥3॥ 3386 ब्रह्मYाान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं॥1॥ रिघों पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर ह्मणोनियां ॥2॥ । तुका ह्मणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्याच्या गळां ॥3॥ 3387 कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥1॥ ग्वाही बहुतांची घालूनियां वरि । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥ तुह्मां वेगळा लागें आपल्या च ठायीं । होतें करुनि तें ही माझें माझें ॥2॥ भांडण सेवटीं जालें एकवट । आतां कटकट करूं नये ॥3॥ ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आतां नाहीं सत्ता तुज देवा ॥4॥ तुका ह्मणे वांयांविण खटपटा । राहिलों मी वांटा घेऊनियां ॥5॥ 3388 देहबुिद्ध वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥1॥ थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥ गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥2॥ पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥3॥ तुका ह्मणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥4॥ 3389 निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपलीं ती फळें न संडी च ॥1॥ तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुनि सांडी ॥ध्रु.॥ परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥2॥ तुका ह्मणे वेळू चंदना संगतीं । काय ते नसती जविळकें ॥3॥ 3390 दुबळें सदैवा । ह्मणे नागवेल केव्हां ॥1॥ आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥ मूढ सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥2॥ गांढें देखुनि शूरा । उगें करितें बुरबुरा ॥3॥ आणिकांचा हेवा । न करीं शरण जाइप देवा ॥4॥ तुका ह्मणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥5॥ 3391 माझी आतां लोक सुखें निंदा करू । ह्मणती विचारू सांडियेला ॥1॥ कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥2॥ तुका ह्मणे काय करूं लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥3॥ 3392 ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥1॥ ओढाळाच्या संगें साित्वक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥ डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥2॥ विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥3॥ भावें तुका ह्मणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौ†याशीचा ॥4॥ 3393 भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥1॥ सुख दुःख तुज देइऩन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥ तुझा दास ह्मणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥2॥ कासया मी तुज भाकितों करुणा । तारीं नारायणा ह्मणवुनि ॥3॥ तुका ह्मणे तुज येऊं पाहे उणें । तारिसील तेणें आह्मां तया ॥4॥ 3394 गातों नाचतों आनंदें । टाळघागरिया छंदें ॥1॥ तुझी तुज पुढें देवा । नेणों भावे कैसी सेवा ॥ध्रु.॥ नेणों ताळ घात मात । भलते सवां पाय हात ॥2॥ लाज नाहीं शंका । प्रेम घाला ह्मणे तुका ॥3॥ 3395 रुसलों आह्मीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥1॥ आह्मां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥ दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथें ॥2॥ उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें॥3॥ तुका ह्मणे करा होइऩल ते दया । सुख दुःख वांयां न धरावें ॥4॥ 3396 सांडुनि सुखाचा वांटा । मुिH मागे तो करंटा ॥1॥ कां रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावें नाम ॥ध्रु.॥ येथें मिळतो दहीं भात । वैकुंठीं ते नाहीं मात ॥2॥ तुका ह्मणे आतां । मज न लगे सायुज्यता ॥3॥ 3397 पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥1॥ ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥ जोडोनियां करकमळ । नेत्र जळ भरोनि ॥2॥ तुका उभें दारीं पात्र । पुरवीं आर्त विठोबा ॥3॥ 3398 आतां हें सेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्प ॥1॥ नुपेक्षावें आह्मां दीना पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुह्मीं ॥ध्रु.॥ वोळवुनी देह सांडियेली शुद्ध । सारियेला भेद जीव शिव ॥2॥ तुका ह्मणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी॥3॥ 3399 तरि च होय वेडी । नग्न होय धडफुडी ॥1॥ काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥ मृगजळा न्याहािळतां। तान न वजाये सेवितां ॥2॥ न पाहे आणिकांची आस । शूर बोलिजे तयास ॥3॥ तुका ह्मणे हें लक्षण । संत अळंकार लेणें॥4॥ 3400 आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प ॥1॥ सहजा ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ध्रु.॥ तैं न भेटे तें काय । मना अंगींचे उपाय ॥2॥ तुका ह्मणे धरीं सोय । वासनेची फोडा डोय ॥3॥ 3401 न करीं पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥1॥ सर्वकाळ नामचिंतन मानसीं । समाधान मनासी समाधि हे ॥ध्रु.॥ न करीं भ्रमण न रिघें कपाटीं । जाइऩन तेथें दाटी वैष्णवांची ॥2॥ अनु नेणें कांहीं न वजें तपासी । नाचें दिंडीपाशीं जागरणीं ॥3॥ उपवास व्रत न करीं पारणें । रामकृष्ण ह्मणें नारायण ॥4॥ आणिकांची सेवा स्तुती नेणें वाणूं । तुका ह्मणे आणु दुजें नाहीं ॥5॥ 3402 पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥1॥ आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥ उभा कटीं ठेवुनि कर। न ह्मणे पर बैससें ॥2॥ तुका ह्मणे जगदीशा । करणें आशा भHांची ॥3॥ 3403 बाळ काय जाणे जीवनउपाय । मायबाप वाहे सर्व चिंता ॥2॥ आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु ॥ आपुलें शरीर रिक्षतां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥2॥ तुका ह्मणे माझा विठ्ठल जनिता । जेथें आमची सत्ता तयावरी ॥3॥ 3405 काय करिती केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥1॥ तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥ विष्णुमूतिऩपाद पाहतां चरण । तेथें कर्म कोण राहूं शके ॥2॥ तुका ह्मणे नाम जाळी महादोष । जेथें होय घोष कीर्तनाचा ॥3॥ 3406 वेद नेलें शंखासुरें । केलें ब्रह्म्यानें गा†हाणें ॥1॥ धांव धांव झडकरी । ऐसें कृपाळुवा हरी ॥ध्रु.॥ गजेंद्र नाडियें गांजिला ॥ तेणें तुझा धांवा केला ॥ 2॥ तुका ह्मणे पद्मनाभा । जेथें पाहें तेथें उभा ॥3॥ 3407 माकडा दिसती कंवटी नारळा । भोHा निराळा वरील सारी ॥1॥ एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥ सुनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥2॥ तुका ह्मणे भार वागविती मूर्ख । नेतील तें सार परीक्षक ॥3॥ 3408 भेटीची आवडी उताविळ मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥1॥ आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देइप ॥ध्रु.॥ नेत्र उन्मिळत राहिले ताटस्त । गंगा अश्रुपात वहावली ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥3॥ 3409 धवळलें जगदाकार । आंधार तो निरसला ॥1॥ लपों जातां नाहीं ठाव । प्रगट पा पसारा ॥ध्रु.॥ खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे ॥2॥ तुका ह्मणे जिवें साटीं ॥ पडिली मिठी धुरेसी ॥3॥ 3410 मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥1॥ ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपऑयाचा तारा दगडासी ॥ध्रु.॥ भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवे परि संग नव्हे तैसा ॥2॥ तुका ह्मणे करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥3॥ 3411 लावूनि कोलित । माझा करितील घात ॥1॥ ऐसे बहुतांचे संधी । सांपडला खोळेमधीं ॥ध्रु.॥ पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥2॥ तुका ह्मणे रिघे । पुढें नाहीं जालें धींगे ॥3॥ 3412 ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं ॥1॥ साच आपुल्या पुरतें । करून नेघेती कां हितें ॥ध्रु.॥ कां हीं वेचितील वाणी। निरर्थक चि कारणीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । कांहीं समर्पूनि सेवा ॥3॥ 3413 चालिले सोबती । काय मानिली नििश्चती ॥1॥ काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥ध्रु.॥ कांहीं सावध तो बरवा । करीं आपुला काढावा ॥2॥ चालिले अगळे । हळू च कान केश डोळे ॥3॥ वोसरले दांत । दाढा गडबडल्या आंत ॥4॥ एकली तळमळ । जिव्हा भलते ठायीं लोळे ॥5॥ तुका ह्मणे यांणीं। तुझी मांडिली घालणी ॥6॥ 3414 नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥1॥ आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥ येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥2॥ मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी॥3॥ सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकन ॥4॥ पडों नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥5॥ 3415 जाले आतां सांटे । कासयाचे लहान मोटे ॥1॥ एक एका पडिलों हातीं । जाली तेव्हां चि नििंश्चती ॥ध्रु.॥ नाहीं फिरों येत मागें । जालें साक्षीचिया अंगें ॥2॥ तुका ह्मणे देवा । आतां येथें कोठें हेवा ॥3॥ 3416 माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥1॥ सहस्रनामाचें रूपडें । भH कैवारी चोखडें ॥ध्रु.॥ साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥2॥ तुका ह्मणे माल । माझा खरा तो विठ्ठल ॥3॥ 3417 करूं स्तुती तरि ते निंदा । तुह्मी जाणां हे गोविंदा॥1॥ आह्मां लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल ॥ध्रु.॥ बोबडएा उत्तरीं । तुह्मा रंजवितों हरी ॥2॥ मागतों भातुकें । तुका ह्मणे कवतुकें ॥3॥ 3418 नव्हतील जपें नव्हतील तपें । आह्मांसी हें सोपें गीतीं गातां ॥1॥ न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे कीर्त्तनामाजी हरि ॥ध्रु.॥ जयासी नाहीं रूप आणि आकार । तो चि कटी कर उभा विटे ॥2॥ अनंत ब्रह्मांडें जयाचिया पोटीं । तो आह्मां संपुष्टीं भिHभावें ॥3॥ तुका ह्मणे वर्म जाणती लडिवाळें । जें होतीं निर्मळें अंतर्बाहीं ॥4॥ 3419 आह्मी जालों बिळवंत । होऊनियां शरणागत ॥1॥ केला घरांत रिघावा । ठायीं पडियेला ठेवा ॥ध्रु.॥ हातां चढलें धन। नेणं रचिलें कारण ॥2॥ तुका ह्मणे मिठी । पायीं देउनि केली सुटी ॥3॥ 3420 लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला ॥1॥ करा जोडीचा हव्यास । आलें दुरील घरास ॥ध्रु.॥ फोडिलीं भांडारें। मोहोरलीं एकसरें ॥2॥ अवघियां पुरतें । तुका ह्मणे घ्यावें हातें॥3॥ 3421 एकीं असे हेवा । एक अनावड जीवां ॥1॥ देवें केल्या भिन्न जाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥ध्रु.॥ प्रीतिसाटीं भेद। कोणी पूज्य कोणी निंद्य ॥2॥ तुका ह्मणे कळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥3॥ 3422 स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥1॥ करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥ कळावया वर्म । हा तों पायांचा चि धर्म ॥2॥ तुका ह्मणे सिद्धी । हे चि पाववावी बुद्धी ॥3॥ 3423 रुसलों संसारा । आह्मी आणीक व्यापारा ॥1॥ ह्मणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥ परते चि ना मागें । मोहो निष्ठ‍ जालों अंगें ॥2॥ सांपडला देव । तुका ह्मणे गेला भेव ॥3॥ 3424 हें तों वाटलें आश्चर्य । तुह्मां न धरवे धीर ॥1॥ माझा फुटतसे प्राण । धांवा धांवा ह्मणऊन ॥ध्रु.॥ काय नेणों दिशा। जाल्या तुह्मांविण ओशा ॥2॥ तुका ह्मणे कां गा । नाइकिजे पांडुरंगा ॥3॥ 3425 धांवा केला धांवा । श्रम होऊं नेदी जीवा ॥1॥ वर्षे अमृताच्या धारा । घेइप वोसंगा लेंकरा ॥ध्रु.॥ उशीर तो आतां । न करावा हे चिंता ॥2॥ तुका ह्मणे त्वरें । वेग करीं विश्वंभरे ॥3॥ 3426 जोडिले अंजुळ । असें दानउताविळ ॥1॥ पाहा वाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥ध्रु.॥ तूं धनी मी सेवक । आइक्य तें एका एक ॥2॥ करितों विनंती । तुका सन्मुख पुढती॥3॥ 3427 काय तुज कैसें जाणवेल देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥1॥ सगुण निर्गुण थोर कीं लहान । न कळे अनुमान मज तुझा ॥ध्रु.॥ कोण तो निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥2॥ तुका ह्मणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥3॥ 3428 मी तव बैसलों धरुनियां ध्यास । न करीं उदास पांडुरंगा ॥1॥ नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥ भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें पुरवावी ॥2॥ तुका ह्मणे येऊनियां देइप भेटी । कुरवाळुनी पोटीं धरीं मज ॥3॥ 3429 आतां तुझें नाम गात असें गीतीं । ह्मणोनी मानिती लोक मज ॥1॥ अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥ सज्जन संबंधी तुटली उपाधी ।रोकडी या बंदीं सुटलोंसें ॥2॥ घ्यावा द्यावा कोणें करावा सायास । गेली आशापाश वारोनियां ॥3॥ तुका ह्मणे तुज कळेल तें आतां । करा जी अनंता मायबापा ॥4॥ 3430 कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं जालों देवा ॥1॥ आवरितां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें ॥ध्रु.॥ तुझिया विनोदें आह्मां प्राणसाटी । भयभीत पोटीं सदा दुःखी ॥2॥ तुका ह्मणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हांसे कोण समर्थासी ॥3॥ 3431 सन्मुख चि तुह्मीं सांगावी जी सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥1॥ निघों आह्मी कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥ बोल परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख डोळेभरी ॥2॥ तुका ह्मणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥3॥ 3432 मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥1॥ जीव झुरे तुजसाटीं । वाट पोटीं पहातसें ॥ध्रु.॥ चित्त रंगलें चरणीं । तुजवांचूनि न राहे ॥2॥ तुका ह्मणे कृपावंत । माझी चिंता असावी॥3॥ 3433 कासया वांचूनि जालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥1॥ जातां भलें काय डोिळयांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥ काय मुख पेंव श्वापदाचें धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥2॥ तुका ह्मणे आतां पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥3॥ 3434 नको मज ताठा नको अभिमान । तुजवांचूनि क्षीण होतो जीव ॥1॥ दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवीं मज ॥2॥ तुका ह्मणे तुझें जालिया दर्षण । मग निवारण होइल सर्व ॥3॥ 3435 चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरि माथा ॥1॥ वेळोवेळां देइप क्षेमआलिंगन । वरी अवलोकन कृपादृष्टी॥ध्रु.॥ प्रक्षाळूं दे पाय बैसें माजघरीं । चित्त िस्थर करीं पांडुरंगा ॥2॥ आहे त्या संचितें करवीन भोजन । काय न जेवून करिसी आतां ॥3॥ करुणाकरें नाहीं कळों दिलें वर्म । दुरी होतां भ्रम कोण वारी ॥4॥ तुका ह्मणे आतां आवडीच्या सत्ता । बोलिलों अनंता करवीन तें ॥5॥ 3436 देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥1॥ देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥ देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥2॥ देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा। लागों असत्याचा मळ नेदी ॥3॥ देवाची ते खूण तोडी मायाजाळ। आणि हें सकळ जग हरी ॥4॥ पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ। तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥5॥ 3437 अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुह्मां ॥1॥ माझें कोठें आलें होइऩल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य जालों ॥ध्रु.॥ सर्वकाळ तुह्मी असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥2॥ तुका ह्मणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥3॥ 3438 न करावी चिंता । भय धरावें सर्वथा ॥1॥ दासां साहे नारायण । होय रिक्षता आपण ॥ध्रु.॥ न लगे परिहार । कांहीं योजावें उत्तर ॥2॥ न धरावी शंका । नये बोलों ह्मणे तुका ॥3॥ 3439 भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हा चि ॥1॥ कैसी तुझी वाट पाहों कोणा तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥ चहूं खाणीचिया रंगलोंसें संगें । सुष्ट दुष्ट अंगें धरूनियां ॥2॥ बहुतांचे बहु पालटलों सळे । बहु आला काळें रंग अंगा ॥3॥ उकलूनि नये दावितां अंतर । घडिचा पदर सारूनियां ॥4॥ तुका ह्मणे करीं गोंवळें यासाटीं । आपल्या पालटीं संगें देवा ॥5॥ 3440 संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥1॥ मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा॥2॥ तुका ह्मणे नमस्कारावे दुरून । अंतरीं धरून राहें रूप ॥3॥ 3441 जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥1॥ आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥ होतीं धालीं पोटें। मागें उरलीं उिच्छष्टें ॥2॥ तुका ह्मणे धांव । पुढें खुंटइऩल हांव ॥3॥ 3442 धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥1॥ निजविल्या जागविती । निज पुरवूनि देती ॥ध्रु.॥ एक वेवसाव । त्यांचा संग त्यांचा जीव ॥2॥ हितें केलें हित । ग्वाही एक एकां चित्त ॥3॥ विषमाचें कांहीं । आड तया एक नाहीं ॥4॥ तुका ह्मणे बरीं । घरा येतील त्यापरी ॥5॥ 3443 धोंडएासवें आदिळतां फुटे डोकें । तों तों त्याच्या सुखें घामेजेना ॥1॥ इंगळासी सन्निधान अतित्याइऩ । क्षेम देतां काइऩ सुख वाटे ॥2॥ तुका ह्मणे आह्मांसवें जो रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥3॥ 3444 सरे आह्मांपाशीं एक शुद्धभाव । नाहीं तरी वाव उपचार ॥1॥ कोण मानी वरी रसाळ बोलणें । नाहीं जाली मनें ओळखी तों ॥2॥ तुका ह्मणे आह्मां जाणीवेचें दुःख । न पाहों त्या मुख दुर्जनाचें ॥3॥ 3445 आतां तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥1॥ करील तें पाहें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥ तो चि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥2॥ तुका ह्मणे दासा । नुपेक्षील हा भरवसा॥3॥ 3446 लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥1॥ आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥ध्रु.॥ खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥2॥ तुका ह्मणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥3॥ 3447 माझ्या इंिद्रयांसीं लागलें भांडण । ह्मणतील कान रसना धाली ॥1॥ करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुकाळ पडिला थोर ॥ध्रु.॥ गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें नव्हे ॥2॥ दरुषणें फिटे सकळांचा पांग । जेथें ज्याचा भाग घेइल तें ॥3॥ तुका ह्मणे ऐसें करीं नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥4॥ 3448 सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होइऩन विठ्ठला सर्व तुझा ॥1॥ सर्वकाळ सुख आमच्या मानसीं । राहिलें जयासी नास नाहीं ॥ध्रु.॥ नेणें पुण्य पाप न पाहें लोचनीं । आणिका वांचूनि पांडुरंगा ॥2॥ न करीं आस मुHीचे सायास । भिHप्रेमरस सांडूनियां ॥3॥ गर्भवासीं धाक नाहीं येतां जातां । हृदयीं राहतां नाम तुझें ॥4॥ तुका ह्मणे जालों तुझा चि अंकिला । न भें मी विठ्ठला किळकाळासी ॥5॥ 3449 जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवइऩ भेटला पांडुरंगा ॥1॥ संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष॥ध्रु.॥ धन्य ते संत सिद्ध महानुभाव । पंढरीचा ठाव टाकियेला ॥2॥ प्रेमदाते ते च पतितपावन । धन्य दरुषण होय त्याला ॥3॥ पावटणिया पंथें जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥4॥ प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुखें कांहीं चिंता ॥5॥ तें दुर्लभ संसारासी । जडजीवउद्धारलोकासी ॥6॥ तुका ह्मणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणें ॥7॥ 3450 काय दिवस गेले अवघे चि व†हाडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥1॥ क्षण एके ठायीं मन िस्थर नाहीं । अराणूक कइं होइऩल पुढें ॥ध्रु.॥ कथेचे विरसें दोषा मूळ होय । तरण उपाय कैचा माती ॥2॥ काय तें सांचवुनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय गेलें ॥3॥ ते चि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शब्दरत्नें॥4॥ तुका ह्मणे हें चि बोलावया चाड । उभयतां नाड हित असे ॥5॥ 3451 शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥1॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥ उदक भिन्न असे काइऩ । वाहाळ बावी सरिता नइऩ ॥2॥ सूर्य तेजें निवडी काय। रश्मी रसा सकळा खाय ॥3॥ वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाइप सारखें ॥4॥ करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें॥5॥ वर्त्ते एकविध अिग्न । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥6॥ तुका ह्मणे पात्र चाड । किंवा विसें अमृत गोड ॥7॥ 3452 न धरी प्रतिष्ठा कोणाची यम । ह्मणतां कां रे राम लाजा झणी ॥1॥ सांपडे हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ध्रु.॥ कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥2॥ तुका ह्मणे हित तों ह्मणा विठ्ठल । न ह्मणे तो भोगील कळेल तें ॥3॥ 3453 ह्मणवितां हरी न ह्मणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥1॥ आयुष्यधन त्याचें नेले यमदूतीं । भुलविला नििंश्चतीं कामरंगें ॥ध्रु.॥ नावडे ती कथा देउळासी जातां । िप्रयधनसुता लक्ष तेथें ॥2॥ कोण नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे ह्मणे तुका नागवसी ॥3॥ 3454 कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें ॥1॥ पुण्य घेइप रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें । पेरिल्या बीजाचें । फळ घेइप शेवटीं ॥ध्रु.॥ कथा विरस पाडी आळसें । छळणा करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसें। विटाळसें नावेसी ॥2॥ सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागें दुरी । राहो ह्मणे हरि । विनंती करी तुका हे ॥3॥ 3455 कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसनें ॥1॥ वाट पाहासी आठवाची । सत्ता सतंत कइपची ॥ध्रु.॥ बोलावितां यावें रूपा । सदा निर्गुणीं चि लपा ॥2॥ तुका ह्मणे तूं परदेशी । येथें आह्मां अंगेजिसी ॥3॥ 3456 आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे ॥1॥ तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा ॥ध्रु.॥ माझें केलें मज पारिखें माहेर । नटोनी साचार चाळविलें ॥2॥ सुखासाटीं एक वाहियेलें खांदीं । तेणें बहु मांदी मेळविली ॥3॥ केला चौघाचार नेलों पांचांमधीं । नाहीं दिली शुद्धी धरूं आशा ॥4॥ तुका ह्मणे आतां घेइऩन कांटीवरी । धनी म्यां कैवारी केला देव ॥5॥ 3457 आजिवरि होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी तों केली विटंबणा ॥1॥ आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥ सापें रिग केला कोठें बाळपणीं । होतीसी पापिणी काय जाणों ॥2॥ तुका ह्मणे म्यां हा बुडविला वेव्हार । तुझे चि ढोपर सोलावया ॥3॥ 3458 देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी ॥1॥ मोडिलें या रांडे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥ परिचारीं केली आपुली च रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥2॥ तुका ह्मणे आणा राउळा धरून । फजित करून सोडूं मग ॥3॥ 3459 कां रे तुह्मी निर्मळ हरिगुण गा ना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जा ना ॥1॥ काय गणिकेच्या याती अधिकार मोटा । दोषी अजामेळ ऐसीं नेलीं वैकुंठा ॥ध्रु.॥ ऐसे नेणों मागें किती अनंत अपार । पंच महादोषी पातकां नाहीं पार ॥2॥ पुत्राचिया लोभें नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका ह्मणे त्याचें पुण्य॥3॥ 3460 बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥1॥ ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥ घरीच्या घरीं भांडवल । न लगे बोल वेचावे ॥2॥ तुका ह्मणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥3॥ 3461 नाहीं भ्यालों तरी पावलों या ठाया । तुह्मां आळवाया जविळकें ॥1॥ सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें तें चिंतन आजिवरी ॥ध्रु.॥ नवनीतासाटीं खादला हा जीव । थोडएासाटीं कीव कोण करी ॥2॥ तुका ह्मणे ताक न लगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवण ॥3॥ 3462 सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥1॥ सेवटींच्या घासें गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ध्रु.॥ वंचूं नये आतां कांहीं च प्रकार । धाकल्याचें थोर जाल्यावरी ॥2॥ तुका ह्मणे आतां बहु चाळवावें । कांहीं नेदीं ठावें उरों मागें ॥3॥ 3463 पोट धालें मग न लगे परती । जालिया नििंश्चती खेळ गोड ॥1॥ आपुलिया हातें देइऩ वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥ध्रु.॥ घराचा विसर होइऩल आनंद । नाचेन मी छंदें प्रेमाचिया ॥2॥ तुका ह्मणे तों च वरी करकर । मग हें उत्तर खंडइऩल ॥3॥ 3464 बोलविसी तरी । तुझ्या येइऩन उत्तरीं ॥1॥ कांहीं कोड कवतिकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥ बोलविसी तैसें । करीन सेवन सरिसें ॥2॥ तुका ह्मणे देवा । माझें चळण तुज सवा॥3॥ 3465 दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥1॥ आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥ माझीया मरणें । तुह्मी बैसविलें ठाणें ॥2॥ तुका ह्मणे काइप । मी हें माझें येथें नाहीं॥3॥ 3466 एकाचिये वेठी । सांपडलों फुकासाटीं ॥1॥ घेतों काम सत्ताबळें । माझें करूनि भेंडोळें ॥ध्रु.॥ धांवे मागें मागें । जाय तिकडे चि लागे ॥2॥ तुका ह्मणे नेलें । माझें सर्वस्वें विठ्ठलें ॥3॥ 3467 बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साटीं तें ॥1॥ तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥ मागलिया पेणें पावे । विसांवे तें ठाकणीं ॥2॥ तुका ह्मणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥3॥ 3468 आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥1॥ उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ध्रु.॥ नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें सांतवीजे ॥2॥ तुका ह्मणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥3॥ 3469 बहुजन्में सोस केला । त्याचा जाला परिणाम ॥1॥ विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ध्रु.॥ येथुन तेथवरी आतां । न लगे चिंता करावी ॥2॥ तुका ह्मणे धालें मन । हें चि दान शकुनाचें ॥3॥ 3470 उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥1॥ शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें धरूनि ॥ध्रु.॥ भागलों या खटपटे । घटपटें करितां ॥2॥ तुका ह्मणे कृपावंता । माझी चिंता खंडावी॥3॥ 3471 तुह्मांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥1॥ कां बा तुह्मी ऐसें नेणें । निष्ठ‍पणें टािळत असां ॥ध्रु.॥ आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥2॥ तुका ह्मणे जगदीशा । काय असां निजेले ॥3॥ 3472 नेलें सळेंबळें । चित्तावित्ताचें गांठोळें ॥1॥ साहए जालीं घरिच्या घरीं । होतां ठायीं च कुठोरी ॥ध्रु.॥ मी पातलों या भावा । कपट तें नेणें देवा ॥2॥ तुका ह्मणे उघडें केलें । माझें माझ्या हातें नेलें ॥3॥ 3473 जाला हा डांगोरा । मुखीं लहानाचे थोरा ॥1॥ नागविलों जनाचारीं । कोणी बैसों नेदी दारी ॥ध्रु.॥ संचिताचा ठेवा। आतां आला तैसा घ्यावा ॥2॥ तुका ह्मणे देवें । ह्मणों केलें हें बरवें ॥3॥ 3474 किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥1॥ असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥ध्रु.॥ आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥2॥ तुका ह्मणे खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥3॥ 3475 पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥1॥ बहुतांसी दिला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥ याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥2॥ तुका ह्मणे माझे हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं सके ॥3॥ 3476 ठेवूनि इमान राहिलों चरणीं । ह्मणउनि धणी कृपा करी ॥1॥ आह्मांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥ करूनि सांभाळीं राहिला निराळा । एक एक वेळा आYाा केली ॥2॥ तुका ह्मणे योग्यायोग्य विनीत । देवा नाहीं चित्त येथें देणें ॥3॥ 3477 आतां नव्हे गोड कांहीं करितां संसार । आणीक संचार जाला माजी ॥1॥ ब्रह्मरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग पालटला ॥ध्रु.॥ रसनेचिये रुची कंठीं नारायण । बैसोनियां मन निवविलें ॥2॥ तुका ह्मणे आतां बैसलों ठाकणीं । इच्छेची ते धणी पुरइऩल ॥3॥ 3478 आतां काशासाटीं दुरी । अंतर उरी राखिली ॥1॥ करीं लवकरी मुळ । लहानें [[तीळ]] मुळीचिया ॥ध्रु.॥ दोहीं ठायीं उदेगवाणें । दरुषणें नििंश्चती ॥2॥ तुका ह्मणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥3॥ 3479 पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य ह्मूण ॥1॥ मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचा धन लोभ हेवा ॥ध्रु.॥ देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें ठेविलेंसे ॥2॥ तुका ह्मणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥3॥ 3480 जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥1॥ काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥ वेठीचें मोटळें लटिकें चि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥2॥ तुका ह्मणे कां उगे चि खोल । जवळी दाखवी आपणां बोल ॥3॥ 3481 जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥1॥ किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥ मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥2॥ तुका ह्मणे डेंगा न कळे हित । किती फजित करूं तरी ॥3॥ 3482 अनुतापयुH गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥1॥ त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ ॥ध्रु.॥ षड उर्मी जिंहीं हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगीं ॥2॥ तुका ह्मणे जाती वोळे लवकरी । ठायीं चि अंतरीं शुद्ध होती ॥3॥ 3483 खोल ओले पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥1॥ लटिक्याचे आह्मी नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥ कोणा इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥2॥ तुका ह्मणे कसीं अगी जें उतरे । तें चि येथें सरे जातिशुद्ध ॥3॥ 3484 गोमटएा बीजाचीं फळें ही गोमटीं । बाहे तें चि पोटीं समतुक ॥1॥ जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥ ख†याचे पारखीं येत नाहीं तोटा । निवडे तो खोटा ढाळें दुरी ॥2॥ तुका ह्मणे मज सत्याचि आवडी । करितां तांतडी येत नाहीं ॥3॥ 3485 मन जालें भाट । कीतिऩ मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥1॥ बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥ रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार । करावें उत्तर । सेवा रुजू करूनि॥2॥ पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयें करें । अंगींच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥3॥ 3486 दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळभेद ॥1॥ आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥ मिथ्या मोहें मज लाविला उशीर । तरी हे अंतर जालें होतें ॥2॥ तुका ह्मणे कां रे दाखविसी भिन्न । लटिका चि सीण लपंडाइऩ ॥3 । 3487. कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥ 1॥ धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ ध्रु.॥ होतासी अंतरें झाकिलिया डोळीं । तो मी हा न्याहाळीं धरुनी दृष्टी ॥ 2॥ तुका ह्मणे तुज रडीची च खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ।.3॥ 3488 करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥1॥ केला अहंकार आड । आह्मां जगासी हा नाड ॥ध्रु.॥ यथंभुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥2॥ तुका ह्मणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥3॥ 3489 विश्वास तो देव । ह्मणुनि धरियेला भाव ॥1॥ माझी वदवितो वाणी । ज्याणें धरिली धरणी ॥ध्रु.॥ जोडिलीं अक्षरें । नव्हेती बुद्धीचीं उत्तरें ॥2॥ नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाटीं॥3॥ कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥4॥ तुका ह्मणे झरा । आहे मुळींचा चि खरा ॥5॥ 3490 सुराणीचीं जालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आह्मी देवा ॥1॥ ह्मणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥ कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळऴिचया मुळें िस्थराविलें ॥2॥ लेवविलीं अंगीं आपुलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥3॥ सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥4॥ तुका ह्मणे आह्मी आळवूं आवडी । ह्मणऊनी जोडी दाखविली ॥5॥ 3491 एका वेळे केलें रितें कलिवर । आंत दिली थार पांडुरंगा ॥1॥ पाळण पोषण लागलें ते सोइऩ । देहाचें तें काइऩ सर्वभावें ॥ध्रु.॥ माझिया मरणें जाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाशा ॥2॥ जाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका ह्मणे कांहीं बोलों नये ॥3॥ 3492 पावतों ताडन । तरी हें मोकलितों जन ॥1॥ मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ध्रु.॥ होती अप्रतिष्ठा । हो तों वरपडा कष्टा ॥2॥ तुका ह्मणे मान । होतां उत्तम खंडन ॥3॥ 3493 धरावें तों भय । अंतरोनि जाती पाय ॥1॥ जाल्या तुटी देवासवें । काय वांचोनि करावें ॥ध्रु.॥ कोणासी पारिखें । लेखूं आपणासारिखें ॥2॥ तुका ह्मणे असो । अथवा हें आतां नासो॥3॥ 3494 आह्मांसी सांगाती । होती अराले ते होती ॥1॥ येती आइकतां हाक । दोन मिळोन ह्मणती एक ॥ध्रु.॥ आणिकां उत्तरीं। नसे गोवी वैखरी ॥2॥ तुका ह्मणे बोल । खूण पहाती विठ्ठल॥3॥ 3495 आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ॥1॥ ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥ध्रु.॥ अंकिता ऐसया। होइल पावविलें ठाया ॥2॥ तुका ह्मणे ऐसें । दिलें आभंड प्रकासे ॥3॥ 3496 काहे लकडा घांस कटावे । खोद हि जुमीन मठ बनावे ॥1॥ देवलवासी तरवरछाया । घरघर माइऩ खपरिबसमाया॥ध्रु.॥ कां छांडियें भार फेरे सीर भागें । मायाको दुःख मिटलिये अंगें॥2॥ कहे तुका तुम सुनो हो सिद्धा । रामबिना और झुटा कछु धंदा ॥3॥ 3497 आणीक पाखांडें असती उदंडें । तळमिळती पिंडें आपुलिया ॥1॥ त्याचिया बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥ दृढ एक चित्तें जालों या जीवासी । लाज सर्वविशीं तुह्मांसी हे ॥2॥ पीडों नेदी पशु आपुले अंकित । आहे जें उचित तैसें करा ॥3॥ तुका ह्मणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येइल तुह्मां ॥4॥ 3498 व्हावया भिकारी हें आह्मां कारण । अंतरोनि जन जावें दुरी ॥1॥ संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । ह्मणऊनि आस मोकलिली ॥2॥ तुका ह्मणे दुःखें उबगला जीव । ह्मणऊनी कीव भाकीं देवा ॥3॥ 3499 कोरडिया ऐशा सारून गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥1॥ खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥ लौकिकाचा आड येइऩल पसारा । मग येरझारा दुःख देती ॥2॥ तुका ह्मणे डांख लागे अळंकारें । मग नव्हे खरें पुटाविण ॥3॥ 3500 ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां ॥1॥ माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥ध्रु.॥ पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥2॥ संचित तें करी । नरका जाया मेल्यावरी ॥3॥ परउपकार । न घडावा हा विचार ॥4॥ तुका ह्मणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥5॥ 3501 करूनी चिंतन खेळों भोवतालें । चित्त येथें आलें पायांपाशीं ॥1॥ येथें नाहीं खोटा चालत परिहार । जाणसी अंतर पांडुरंगा ॥ध्रु.॥ सुखदुःखें तुज देऊनी सकळ । नाहीं ऐसा काळ केला आह्मी ॥2॥ तुका ह्मणे जाला देहाचा विसर । नाहीं आतां पर आप दोन्ही ॥3॥ 3502 काळा च सारिखीं वाहाती क्षेत्रें । करितां दुसरें फळ नाहीं ॥1॥ ऐसें करत्यानें ठेविलें करून । भरिलें भरून माप नेमें॥ध्रु.॥ शीतउष्णकाळीं मेघ वरुषावे । वरुषतां वाव होय शीण॥2॥ तुका ह्मणे विष अमृताचे किडे । पालट न घडे जीणें तया ॥3॥ 3503 बोलणें तें आह्मी बोलों उपयोगीं । पडिलें प्रसंगी काळाऐसें ॥1॥ जयामध्यें देव आदि मध्यें अंतीं । खोल पाया भिंती न खचेसी ॥ध्रु.॥ करणें तें आह्मी करूं एका वेळे । पुढिलिया बळें वाढी खुंटे ॥2॥ तुका ह्मणे असों आYोचीं धारकें । ह्मणऊनि एकें घायें सारूं ॥3॥ 3504 तुझिया विनोदें आह्मांसी मरण । सोसियेला सीण बहु फेरे ॥1॥ आतां आपणें चि येसी तें करीन । नाम हें धरीन तुझें कंठीं ॥ध्रु.॥ वियोगें चि आलों उसंतीत वनें । संकल्प हे मनें वाहोनियां ॥2॥ तुका ह्मणे वर्म सांपडलें सोपें । गोवियेलों पापें पुण्यें होतों ॥3॥ 3505 पाठीलागा काळ येतसे या लागें । मी माझें वाउगें मेंढीऐसें ॥1॥ आतां अगी लागो ऐसिया वेव्हारा । तूं माझा सोइरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ वागविला माथां नसतां चि भार । नव्हे तें साचार जाणील तों ॥2॥ तुका ह्मणे केलें जवळील दुरी । मृगजळ वरी आड आलें ॥3॥ 3506 आपुलिये टाकीं । करीन कांहीं तरी एकी ॥1॥ करीन पायांशीं वोळखी । करिसी तें करीं सुखीं ॥ध्रु.॥ कायाक्लेशगंगाजळ । समर्पीन तुळसीदळ ॥2॥ तुका ह्मणे देवा । कर जोडीन ते सेवा ॥3॥ 3507 माझे तों स्वभाव मज अनावर । तुज ही देतां भार कांहीं नव्हे ॥1॥ ऐसें कळों आलें मज नारायणा । जागृती स्वपना ताळ नाहीं ॥ध्रु.॥ संपादितों तो अवघा बाहए रंग । तुझा नाहीं संग अभ्यंतरीं ॥2॥ तुका ह्मणे सत्या नाहीं पाठी पोट । असतें निघोंट एकी जाती ॥3॥ 3508 नव्हावा तो बरा मुळीं च संबंध । विश्वासिकां वध बोलिलासे ॥1॥ आतां माझें हित काय तें विचारा । सत्यत्वें दातारा पांडुरंगा ॥ध्रु ॥ नाहीं भाव परी ह्मणवितों दास । नका देऊं यास उणेंयेऊं ॥2॥ तुका ह्मणे कां हो उद्धरितां दीन । मानीतसां सीण मायबापा॥3॥ 3509 काय तुमचिया सेवे न वेचते गांठोळी । मोहें टाळाटाळी करीतसां ॥1॥ चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरी सांगा निवडूनि ॥ध्रु.॥ कोण तुह्मां सुख असे या कौतुकें । भोगितां अनेकें दुःखें आह्मा ॥2॥ तुका ह्मणे काय जालासी निर्गुण । आह्मां येथें कोण सोडवील ॥3॥ 3510 निष्ठ‍ यासाटीं करितों भाषण । आहेसी तूं सर्वजाण दाता ॥1॥ ऐसें कोण दुःख आहे निवारिता । तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥ बैसलासी केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुस†याची ॥2॥ तुका ह्मणे आलें अवघें चि पायापें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥3॥ 3511 पायांपासीं चित्त । तेणें भेटी अखंडित ॥1॥ असे खेळे भलते ठायीं । प्रेमसूत्रदोरी पायीं ॥ध्रु.॥ केलेंसे जतन । मुळीं काय तें वचन ॥2॥ तुका ह्मणे सर्वजाणा । ठायीं विचारावें मना॥3॥ 3512 तुझे मजपाशीं मन । माझी येथें भूक तान ॥1॥ जिव्हा रतें एके ठायीं । दुजें बोलायाचें काइऩ ॥ध्रु.॥ माझिया कवतुकें । उभा पहासी भातुकें ॥2॥ तुका ह्मणे साचें । तेथें मागील कइऩचें ॥3॥ 3513 तुह्मां आह्मां सरी । येथें कइऩच्या या परी ॥1॥ स्वामिसेवा अळंकार । नाहीं आवडिये थार ॥ध्रु.॥ खुंटलिया वाचा। मग हा आनंद कइचा ॥2॥ तुका ह्मणे कोडें । आह्मी नाचों तुज पुढें ॥3॥ 3514 कैचें भांडवल खरा हातीं भाव । कळवऑयानें माव दावीतसें ॥1॥ आतां माझा अंत नको सर्वजाणा । पाहों नारायणा निवडूनि ॥ध्रु.॥ संतांचें उिच्छष्ट मागिले पंगती । करावें संगती लागे ऐसें ॥2॥ तुका ह्मणे आलों दावूनि विश्वास । संचित तें नास पावे ऐसें ॥3॥ 3515 थोडे तुह्मी मागें होती उद्धरिले । मज ऐसे गेले वांयां जीव ॥1॥ आतां याचा काहीं न मनावा भार । कृपेचा सागर आहेसी तूं ॥ध्रु.॥ तुज आळवितां पापाची वसति । राहे अंगीं किती बळ त्याचें ॥2॥ तुका ह्मणे उदकीं तारिले दगड । तैसा मी ही जड एक देवा ॥3॥ 3516 आह्मी ह्मणों कोणी नाहीं तुज आड । दिसतोसी भ्याड पांडुरंगा ॥1॥ हागे माझ्या भोगें केलासी परता । विश्वंभरीं सत्ता नाहीं ऐसी ॥ध्रु.॥ आह्मी तुज असों देऊनि आधार । नाम वारंवार उच्चारितों ॥2॥ तुका ह्मणे मज धरियेलें बळें । पंचभूतीं खळें करूनियां ॥3॥ 3517 आहेतें सकळ प्रारब्धा हातीं । यावें काकुलती यासी आतां ॥1॥ ऐसा माझ्या मनें सांगितला भाव । तोंवरीच देव दुजा नाहीं ॥ध्रु.॥ अवघियांची जेव्हां सारावी करकर । भावबळें थार धरूं येसी ॥2॥ तुका ह्मणे तुज ठेवावें पुजून । आणीक ते गुण नाहीं येथें ॥3॥ 3518 सेवट तो होती तुझियानें गोड । ह्मणऊनि चाड धरीतसों ॥1॥ देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥ तुझ्या बळें कांहीं खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥2॥ तुका ह्मणे आह्मी चेंपलों या भारें । तुमचें तें खरें देवपण ॥3॥ 3519 ऐसा चि तो गोवा । न पाहिजे केला देवा ॥1॥ बहु आली दुरिवरी । ओढत हे भरोवरी ॥ध्रु.॥ आह्मांसी न कळे । तुह्मी झाकुं नये डोळे ॥2॥ तुका ह्मणे संगें । असों एक एका अंगें॥3॥ 3520 मायलेंकरांत भिन्न । नाहीं उत्तराचा सीण ॥1॥ धाडीं धाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥ करूनि नवल। याचें बोलिलों ते बोल ॥2॥ तुका ह्मणे माते । पांडुरंगे कृपावंते॥3॥ 3521 आवडी कां ठेवूं । बैसोनियां संगें जेवूं ॥1॥ मागें नको ठेवूं उरी । माझी आण तुजवरी ॥ध्रु.॥ देखिले प्रकार । त्याचे पाहेन साचार ॥2॥ तुका ह्मणे बाळीं । केली चाहाडी सकळीं॥3॥ 3522 नव्हेसी तूं लांसी । मायां आणिकां त्या ऐसी ॥1॥ जे हे वांयां जाती बोल । होती निर्फळ चि फोल ॥ध्रु.॥ नव्हेसी दुबळी । कांहीं नाहीं तें जवळी ॥2॥ तुका ह्मणे खोटी । कांहीं नव्हेसी करंटी ॥3॥ 3523 आह्मां बोल लावा । तुह्मां अनुचित हें देवा ॥1॥ ऐसें सांगा कां व्यालेती । काय नाहीं तुह्मां हातीं ॥ध्रु.॥ आतां धरा दुरी । वांयां दवडाया थोरी ॥2॥ तुका ह्मणे ठायीं । ऐसें विचारावें पायीं ॥3॥ 3524 मरोनियां गेली माया । मग तया कोण पुसे ॥1॥ पोरटियांची दाद कोणा । ऐसा जाना प्रवाहो ॥ध्रु.॥ निढळास निढळ जोडा । होय कोडा कवतुका ॥2॥ तुका ह्मणे देवाऐसी । आहों सरसीं आपण ॥3॥ 3525 संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥1॥ निष्ठ‍ तूं बहु देवा । पुरे हेवा न ह्मणवी ॥ध्रु.॥ पाहोनियां कर्म डोळां । निराळा तो वर्जीना ॥2॥ तुका ह्मणे तुज माझें । ह्मणतां ओझें फुकट ॥3॥ 3526 नव्हतें तें कळों आलें । तरी बोलें अबोला ॥1॥ तुज मज घातली तुटी । एके भेटीपासूनि ॥ध्रु.॥ आतां याची न धरीं चाड । कांहीं कोड कवतुकें ॥2॥ तुका ह्मणे यावें जावें । एका भावें खंडलें ॥3॥ 3527 आतां दोघांमध्ये काय । उरलें होय वाणीजेसें ॥1॥ निष्ठ‍ हें केलें मन । समाधान न करूनि ॥ध्रु.॥ झुरावें तें तेथींच्या परी । घरिच्याघरीं अवघिया ॥2॥ तुका ह्मणे देवपण । गुंडाळून असों दे ॥3॥ 3528 मागितल्यास आस करा । उरी धरा कांहींबाहीं ॥1॥ ह्मणऊनि सारिली आस । होती यास मूळ तें ॥ध्रु.॥ माझ्या मोहें तुज पान्हा । लोटे स्तना वोरस ॥2॥ तुका ह्मणे आळवणे । माझ्या देणें उत्तर ॥3॥ 3529 आतां बरें घरिच्याघरीं । आपली उरी आपणापें॥1॥ वाइटबरें न पडे दृष्टी । मग कष्टी होइजेना ॥ध्रु.॥ बोलों जातां वाढे बोल । वांयां फोल खटखट ॥2॥ काकुलती यावें देवा । तो तों सेवा इिच्छतो ॥3॥ हिशोबाचे खटखटे । चढे तुटे घडेना ॥4॥ तुका ह्मणे कळों आलें । दुसरें भलें तों नव्हे ॥5॥ 3530 आधीं सोज्वळ करावा मारग । चालतां तें मग गोवी नाहीं ॥1॥ ऐसा चालोनियां आला शिष्टाचार । गोवीचा वेव्हार पापपुण्य ॥ध्रु.॥ पळणें तों पळा सांडुनि कांबळें । उपाधीच्या मुळें लाग पावे ॥2॥ तुका ह्मणे येथें शूर तो निवडे । पडिले बापुडे कालचक्रीं ॥3॥ 3531 उद्धत त्या जाती । द्रवें रंगल्या उद्धती ॥1॥ ह्मणऊनि बहु फार । त्यांसी असावें अंतर ॥ध्रु.॥ कैंचें पाठी पोट । गोडविषासी सेवट ॥2॥ तुका ह्मणे सापा । न कळे कुरवािळलें बापा ॥3॥ 3532 आह्मां कथा आवश्यक । येर संपादूं लौकिक ॥1॥ जैसी तैसी माय बरी । मानिल्या त्या माना येरी ॥ध्रु.॥ व्यालीचा कळवळा । जीव बहुत कोंवळा ॥2॥ कवतुकें वावरें । तुका ह्मणे या आधारें ॥3॥ 3533 पािळतों वचन । परि बहु भीतें मन ॥1॥ करितें पायांशीं सलगी । नये बैसों अंगसंगीं ॥ध्रु.॥ जोडोनियां कर । उभें असावें समोर ॥2॥ तुका ह्मणे संत । तुह्मी मी बहु पतित ॥3॥ 3534 जैसा तैसा आतां । मज प्रमाण अनंता ॥1॥ पायां पडणें न संडीं । पोटीं तें च वर तोंडीं ॥ध्रु.॥ एका भावें चाड । आहे तैसें अंतीं गोड ॥2॥ तुका ह्मणे आह्मां । टळणें चि नाहीं नेमा ॥3॥ 3535 चुकलों या ऐशा वर्मा । तरी कर्मा सांपडलों ॥1॥ पाठी लागे करी नास । गर्भवास भोगवी ॥ध्रु.॥ माझें तुझें भिन्नभावें। गळां दावें मोहाचें ॥2॥ तुका ह्मणे पाठेळ केलों । नसत्या भ्यालों छंदासी ॥3॥ 3536 देह प्रारब्धा शिरीं । असोन करी उद्वेग ॥1॥ धांव घालीं नारायणा । माझ्या मना जागवीं ॥ध्रु.॥ ऐसी चुकोनियां वर्में। पीडा भ्रमें पावलों ॥2॥ तुका ह्मणे कैंचा भोग । नव्हे रोग अंगींचा॥3॥ 3537 अनंताच्या ऐकों कीर्ती । ज्याच्या चित्तीं हरिनाम । उलंघूनि गेले सिंधु । हा भवबंधु तोडोनियां ॥1॥ आतां हळुहळु ते चि वाहीं । चालों कांही अधिकारें ॥ध्रु.॥ खुंटूनियां गेले नावा । नाहीं हेवा खोळंबला । न लगे मोल द्यावा रुका । भावें एका कारणें॥2॥ तुका ह्मणे पाहतों वाट । उभा नीट पाउलीं । भीमातिरीं थडवा केला । उठा चला लवलाहें ॥3॥ 3538 तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥1॥ येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ध्रु.॥ आवरिल्या वृित्त । मन घेउनियां हातीं ॥2॥ तुका ह्मणे जरा । बाहेर येऊं नेदीं घरा ॥3॥ 3539 हें तों एक संतांठायीं । लाभ पायीं उत्तम ॥1॥ ह्मणवितां त्याचे दास । पुढें आस उरेना ॥ध्रु.॥ कृपादान केलें संतीं। कल्पांतीं ही सरेना ॥2॥ तुका ह्मणे संतसेवा । हा चि हेवा उत्तम॥3॥ 3540 नारायणा ऐसा । सेवूं नेणतील रसा ॥1॥ जेणें भवव्याध तुटे । दुःख मागुतें न भेटे ॥ध्रु.॥ न लगे कांहीं आटी । बाधा राहों न सके पोटीं ॥2॥ कैवल्य तें जोडे । पालट लवकरी घडे ॥3॥ जन्ममरणदुःख अटे । जाळें अवघेंचि तुटे ॥4॥ तुका ह्मणे जाला । याचा गुण बहुतांला ॥5॥ 3541 अनेक दोषांचे काट । जे जे गादले निघोंट । होती हरिनामें चोखट । क्षण एक न लगतां ॥1॥ तुह्मी हरि ह्मणा हरि ह्मणा । महादोषांचे छेदना ॥ध्रु.॥ अतिप्रीतीचा बांधला । नष्ट चांडाळीं रतला । क्षण न लगतां नेला । वैकुंठासी हरि ह्मणतां॥2॥ अमित्य दोषाचें मूळ । जालें वाल्मीकास सबळ । जाला हरिनामें निर्मळ । गंगाजळ पैं जैसा ॥3॥ हरि ह्मणतां तरले । महादोषी गणिके नेलें । कुंटणी भिली उद्धरिलें । वैकुंठासी हरि म्हणतां ॥4॥ हरिविण जन्म नको वांयां । जैसी दर्पणींची छाया । ह्मणोनि तुका लागे पायां । शरण तया हरीसी ॥5॥ 3542 भजन या नासिलें हेडि । दंभा लंडा आवडी ॥1॥ जेवीत ना आइता पाक । नासी ताक घुसळूनि ॥ध्रु.॥ एकाएकीं इच्छी पाठ । नेणे चाट कां जेवूं ॥2॥ तुका ह्मणे मुलाम्याचें । बंधन साचें सेवटीं ॥3॥ 3443 जैसा निर्मळ गंगाओघ । तैसा भाग वोगरीं ॥1॥ प्रेम वाढे ग्रासोग्रासीं । ब्रह्मरसीं भोजन ॥ध्रु.॥ तृप्तीवरि आवडी उरे। ऐसे बरे प्रकार ॥2॥ तुका ह्मणे पाख मन । नारायण तें भोगी॥3॥ 3444 सुख सुखा विरजण जालें । तें मथलें नवनीत ॥1॥ हाले डोले हरुषे काया । निवती बाहएा नयन ॥ध्रु.॥ प्रबल तो नारायण । गुणें गुण वाढला ॥2॥ तुका ह्मणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥3॥ 3545 कां रे न भजसी हरी । तुज कोण अंगीकारी ॥1॥ होइल यमपुरी । यमदंड यातना ॥ध्रु.॥ कोण जाली लगबग । काय करिसि तेथें मग ॥2॥ कां रे भरला ताठा । करिती वोज नेतां वाटा॥3॥ तोंडा पडिली खिळणी । जिव्हा पिटिती वोढूनि ॥4॥ कां रे पडिली जनलाज । कोण सोडवील तुज ॥5॥ लाज धरीं ह्मणे तुका । नको वांयां जाऊं फुका ॥6॥ 3546 क्षरला सागर गंगा ओघीं मिळे । आपण चि खेळे आपणाशीं ॥1 ॥ मधील ते वाव अवघी उपाधि । तुह्मां आह्मांमधीं ते चि परी ॥ध्रु.॥ घट मठ जाले आकाशाचे पोटीं । वचनें चि तुटी तेथें चि तें ॥2 ॥ तुका ह्मणे बीजें बीज दाखविलें । फल पुष्प आलें गेलें वांयां ॥3॥ 3547 एक आतां तुह्मी करा । मज दातारा सत्तेनें ॥1॥ विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥ जाणत चि दुजें नाहीं । आणिक कांहीं प्रकार ॥2॥ तुका ह्मणे शरण आलों । काय बोलों विनवितों॥3॥ 3548 काय विनवावें कोणें तो निवाड । केलें माझ्या कोड वचनाचें ॥1॥ आहो कृपनिधी गुणांच्या निधाना । माझ्या अनुमाना नये चि हें ॥ध्रु.॥ बहुत करुणा केलेंसे भासेन । एक ही वचन नाहीं आलें ॥2॥ माझी कांहीं सेवा होइऩल पावली । नििंश्चती मानिली होती ऐसी ॥3॥ तुका ह्मणे माझी उरली ते आटी । अभय कर कटी न देखें चि ॥4॥ 3549 लाजोनियां काळें राहिलें लिखित । नेदितां ही चित्त समाधान ॥1॥ कैसें सुख वाटे वचनाचे तुटी । प्रीतिविण भेटी रुचि नेदी ॥ध्रु.॥ एकाचिये भेटी एकाचा कोंपर । मावेचा पदर कळों येतो ॥2॥ होत्या आपल्या त्या वेचूनियां शHी । पुढें जालों युिHकळाहीन ॥3॥ तुका ह्मणे तुह्मी समर्थ जी देवा । दुर्बळाची सेवा कोठें पावे ॥4॥ 3550 आशाबद्ध बहु असे निलाजिरें । होय ह्मणें धीरें फळ टोंकें ॥1॥ कारणापें चित्त न पाहें अपमान । चित्त समाधान लाभासाटीं ॥2॥ तुका ह्मणे हातें लोटिलें न कळे । झांकितसें डोळे पांडुरंगा ॥3॥ 3551 सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥1॥ कां नेणें निष्ठ‍ केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥2॥ तुका ह्मणे ऐसा न देखें निवाड । कडू किंवा गोड फळ पोटीं ॥3॥ 3552 वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥1॥ नाहीं सरता जालों पायीं । तुह्मी जइप न पुसा ॥ध्रु.॥ कां मी जीतों संवसारीं । अद्यापवरी भूमिभार ॥2॥ तुका ह्मणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥3॥ 3553 कासया हो माझा राखिला लौकिक । निवाड कां एक केला नाहीं ॥1॥ मग तळमळ न करितें मन । जालें तें कारण कळों येतें ॥2॥ तुका ह्मणे केला पाहिजे निवाड । वइदासी भीड मरणें रोग्या ॥3॥ 3554 ऐसें कोण पाप बळी । जें जवळी येऊं नेदी ॥1॥ तुह्मां तंव होइल ठावें । नेदावें कां कळों हें ॥ध्रु.॥ कोण जाला अंतराय । कां ते पाय अंतरले ॥2॥ तुका ह्मणे निमित्याचा । आला सुच अनुभव ॥3॥ 3555 ब्रह्मYाानाची भरोवरी । पुढिला सांगे आपण न करी॥1॥ थू थू त्याच्या तोंडावरी । व्यर्थ सिणवी वैखरी ॥ध्रु.॥ कथा करी वरिवरी । प्रेम नसे चि अंतरीं ॥2॥ तुका ह्मणे कवित्व करी । मान वस्तु हे आदरी ॥3॥ 3556 कधीं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥1॥ भेटी लागीं पंढरीनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा ॥ध्रु.॥ सिणलें माझें मन । वाट पाहतां लोचन ॥2॥ तुका ह्मणे लागली भूक । तुझें पहावया श्रीमुख ॥3॥ 3557 उच्चारूं यासाटीं । आह्मी नाम तुझें कंठीं ॥1॥ येसी धांवत धांवत । माउलिये कृपावंते ॥ध्रु.॥ पाय चित्तीं धरूं । क्रिडा भलते ठायीं करूं ॥2॥ तुका ह्मणे माझे गंगे । प्रेमभरित पांडुरंगे ॥3॥ 3558 दगडाच्या देवा बगाड नवस । बाइऩल कथेस जाऊं नेदी ॥1॥ वेची धनरासी बांधलें स्मशान । दारीं वृंदावन द्वाड मानी॥ध्रु.॥ चोरें नागविला न करी त्याची खंती । परी द्विजा हातीं नेदी रुका ॥2॥ करी पाहुणेर विव्हाया जावयासी । आल्या अतीतासी पाठमोरा ॥3॥ तुका ह्मणे जळो धिग त्याचें जिणें । भार वाही सीण वर्म नेणे ॥4॥ 3559 करूनि विनवणी । माथा ठेवितों चरणीं ॥1॥ होतें तें चि असों द्यावें । रूप सौम्य चि बरवें ॥ध्रु.॥ भया भेणें तुमचा ठाव । तुमच्या कोपें कोठें जावें ॥2॥ तुका पायां लागे । दान समुदाय मागे ॥3॥ 3560 प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥1॥ कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ध्रु.॥ पोटामध्यें कोण सांगितलें सर्पां । उपजत लपा ह्मणऊनि ॥2॥ बोलों नेणें परी जाणे गोड क्षार । अंतरीं विचार त्यासी ठावा ॥3॥ तुका ह्मणे बरें विचारावें मनीं । आणिक भल्यांनी पुसों नये ॥4॥ 3561 आतां मी पतित ऐसा साच भावें । कळों अनुभवें आलें देवा ॥1॥ काय करावें तें रोकडें चि करीं । राहिली हे उरी नाहीं दोघां ॥ध्रु.॥ येर येरा समदृष्टी द्यावें या उत्तरा । यासी काय करा गोही आतां ॥2॥ तुका ह्मणे मेलों सांगतसांगतां । तें चि आलें आतां कळों तुह्मां ॥3॥ 3562 काय तुज मागें नाहीं जाणवलें । माझें नाहीं केलें हित कांहीं ॥1॥ डोळे झांकुनियां होसी अबोलणा । तेव्हां नारायणा आतां कैसा ॥ध्रु.॥ न कळे उचित न संगतां स्पष्ट । ऐसा क्रियानष्ट काय जाणे ॥2॥ तुका ह्मणे माझा घात तुह्मां ठावा । तरि कां आधीं देवा वारूं नये ॥3॥ 3563 नये ऐसें बोलों कठिण उत्तरें । सलगी लेंकुरें केली पुढें ॥1॥ अपराध कीजे घडला तो क्षमा । सिकवा उत्तमा आमुचिया॥ध्रु.॥ धरूं धावें आगी पोळलें तें नेणे । ओढिलिया होणें माते बाळा ॥2॥ तुका ह्मणे फार ज्याचा जार त्यासी । प्रवीण येविशीं असा तुह्मी ॥3॥ 3564 लडिवाळ ह्मणोनी निष्ठ‍ न बोला । परी सांभािळला लागे घात ॥1॥ बहु वागवीत आणिलें दुरूनि । दासांची पोसनी बहु आहे ॥ध्रु.॥ नाहीं लागों दिला आघाताचा वारा । निष्ठ‍ उत्तरा कोमेजतों ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी कृपावंत हरि । शांतवा उत्तरीं अमृताच्या ॥3॥ 3565 आत्मिस्थति मज नको हा विचार । देइऩ निरंतर चरणसेवा ॥1॥ जन्मोजन्मीं तुझा दास पुरुषोत्तमा । हे चि गोडी माझ्या देइप जीवा ॥ध्रु.॥ काय सायुज्यता मुिH हे चि गोड । देव भH कोड तेथें नाहीं ॥2॥ काय तें निर्गुण पाहों कैशा परी । वणूप तुझी हरी कीर्ती कैसी ॥3॥ गोड चरणसेवा देवभHपण । मज देवा झणें दुराविसी ॥4॥ जाणिवेपासूनि सोडवीं माझ्या जीवा । देइऩ चरणसेवा निरंतर ॥5॥ तुका ह्मणे गोडा गोड न लगे प्रीतिकर । प्रीति ते ही सार सेवा हे रे ॥6॥ 3566 चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां ॥1॥ बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं आYाा त्याची ॥2॥ तुका ह्मणे आहे ठायींचा चि मान । आतां अनुमान कायसा तो ॥3॥ 3567 समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥1॥ समर्थासी लाज आपुल्या नांवाची । शरण आल्याची लागे चिंता ॥2॥ जरी तुज कांहीं होइऩल उचित । तरी हा पतित तारीं तुका ॥3॥ 3668 न करीं रे मना कांहीं च कल्पना । चिंतीं या चरणां विठोबाच्या ॥1॥ येथें सुखाचिया रासी । पुढें ठाव नाहीं कल्पनेसी॥ध्रु.॥ सुखाचें ओतिलें साजिरें श्रीमुख । शोक मोह दुःख पाहाता नाहीं ॥2॥ तुका ह्मणे येथें होइऩल विसांवा । तुटतील हांवा पुढिलिया ॥3॥ 3569 काय करूं मज नागविलें आळसें । बहुत या सोसें पीडा केली ॥1॥ हिरोनियां नेला मुखींचा उच्चार । पडिलें अंतर जवळी च ॥ध्रु.॥ द्वैताचिया कैसा सांपडलों हातीं । बहुत करती ओढाओढी ॥2॥ तुका ह्मणे आतां आपुलिया सवें । न्यावें मज देवें सोडवूनि ॥3॥ 3570 नाहीं देवाचा विश्वास । करी संतांचा उपहास ॥1॥ । त्याचे तोंडी पडे माती । हीन शूकराची जाती ॥ध्रु.॥ घोकुनी अक्षर। वाद छळणा करीत फिरे ॥2॥ ह्मणे देवासी पाषाण । तुका ह्मणे भावहीन ॥3॥ 3571 हें चि सर्वसुख जपावा विठ्ठल । न दवडावा पळ क्षण वांयां ॥1॥ हें चि एक सर्वसाधनांचें मूळ । आतुडे गोपाळ येणें पंथें ॥ध्रु.॥ न लगती कांहीं तपांचिया रासी । करणें वाराणसी नाना तीथॉ ॥2॥ कल्पना हे तिळ देहीं अभिमान । नये नारायण जवळी त्यांच्या ॥3॥ तुका ह्मणे नामें देव नेदी भेटी । ह्मणे त्याचे होंटीं कुष्ट होय ॥4॥ 3572 माझे विषयीं तुज पडतां विसर । नको धरूं दूर पांडुरंगा ॥1॥ तुझा ह्मणवितों हे चि लाज तुला । आतां झणी मला विसरेसी ॥2॥ तुका ह्मणे तुझी माझी नाहीं उरी । आतां केली खरी देवराया ॥3॥ 3573 अभHाचे गांवीं साधु म्हणजे काय । व्याघ्रें वाडां गाय सांपडली ॥1॥ कसाबाचे आळी मांडिलें प्रमाण । बस्वणाची आण तया काइऩ ॥ध्रु.॥ केळी आणि बोरी वसती सेजारी । संवाद कोणे परी घडे येथें ॥2॥ तुका ह्मणे [[खीर]] केली का†हेऑयाची । शुद्ध गोडी कैची वसे तेथें ॥3॥ 3574 भागल्यांचा तूं विसांवा । करीं नांवा निंबलोण ॥1॥ परमानंदा पुरुषोत्तमा । हरीं या श्रमापासूनि ॥ध्रु.॥ अनाथांचा अंगीकार। करितां भार न मनिसी ॥2॥ तुका ह्मणे इच्छा पुरे । ऐसें धुरेगे विठ्ठल ॥3॥ 3575 घालूनियां कास । बळें आलों मागायास ॥1॥ प्रेमें देइप पाठवूनि । पांडुरंगा सेवाॠणी ॥ध्रु.॥ होइप रे शाहाणा । कळों नेदावें या जना ॥2॥ तुका ह्मणे पायीं । जडलों मग उरलें काइऩ॥3॥ 3576 भेटीलागीं पंढरिनाथा । जीवीं लागली तळमळ व्यथा॥1॥ कैं कृपा करिसी नेणें । मज दीनाचें धांवणें ॥ध्रु.॥ सीणलें माझें मन । वाट पाहातां लोचन ॥2॥ तुका ह्मणे भूक । तुझें पाहावया मुख ॥3॥ 3577 सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां ॥1॥ शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ध्रु.॥ आलों लोटांगणीं। रुळें तुमचे चरणीं ॥2॥ तुका ह्मणे कइप । डोइऩ ठेवीन हे पायीं॥3॥ 3578 तुझे दारींचा कुतरा । नको मोकलूं दातारा ॥1॥ धरणें घेतलें घरांत । नको धरून उठवूं हात ॥ध्रु.॥ घेतली मुरकुंडी। थोर जालों मी लंडी ॥2॥ तुका ह्मणे जगजीवना । िब्रदें पाहें नारायणा॥3॥ 3579 पडिलों बाहेरि आपल्या कर्तव्यें । संसाराचा जीवें वीट आला ॥1॥ एकामध्यें एक नाहीं मिळों येत । ताक नवनीत निडिळया ॥ध्रु.॥ दोनी जालीं नांवें एकाच्या मथनें । भुस सार गुणें वेगळालीं ॥2॥ तुका ह्मणे कोठें वसे मुHाफळ । सिंपल्याचें स्थळ खंडलिया ॥3॥ 3581 पाहातां हें बरवें जालें । कळों आलें यावरी ॥1॥ मागिलांचा जाला झाडा । त्या निवाडास्तव ॥ध्रु.॥ विसांवलें अंग दिसे । सरिसे अनुभव ॥2॥ तुका ह्मणे बरें जालें । देवें नेलें गवसूनि ॥3॥ 3581 चक्रफेरीं गळीं गळा । होता गोवियेला माळा ॥1॥ फुटोनियां गेला कुंभ । जालों निष्काम स्वयंभ ॥ध्रु.॥ धरित चि नाहीं थारा । वेठी भ्रमण खोंकरा ॥2॥ तुका ह्मणे कौतुक कोडें । आगी काय जाणे मढें ॥3॥ 3582 श्रमपरिहारा । मूळ हें जालें दातारा ॥1॥ देह निवेदूनि पायीं । जालों रिकामा उतराइऩ ॥ध्रु.॥ आपली ते सत्ता । येथें असों नेदीं आतां ॥2॥ राहिला निराळा । तुका कटकटे वेगळा॥3॥ 3583 पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कायाअ देहाकडे नावलोकीं॥1॥ ह्मणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥ कृपेच्या कटाक्षें निभें किळकाळा । येतां येत बळाशHीपुढें ॥2॥ तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥3॥ 3584 उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥1॥ नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम कोरडी वरिवरि ॥ध्रु.॥ सत्याविण काय उगी च लांबणी । कारियाची वाणी येर भूस ॥2॥ तुका ह्मणे ऐसी कोणा चाळवणी । न विचारा मनीं पांडुरंगा ॥3॥ 3585 नव्हें मी आहाच आशेचें बांधलें । जें हें टोंकविलें नारायणा ॥1॥ अंतर तों तुम्हां बरें कळों येतें । वेव्हार उचितें चाळवीजे ॥ध्रु.॥ मनें कल्पीलें आवरितां पाप । संकल्पीं विकल्प याचि नांवें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां न सोसे जळजळ । सिजल्यावरी जाळ कढ खोटा ॥3॥ 3586 ताकें कृपण तो जेवूं काय घाली । आहाच ते चालीवरुनि कळे ॥1॥ काय तुह्मां वेचे घातलें सांकडें । माहें आलें कोडें आजिवरि ॥ध्रु.॥ सेवेंविण आह्मी न लिंपों काया । जाला देवराया निर्धार हा ॥2॥ तुका ह्मणे तुझीं राखावया ब्रीदें । येणें अनुवादें कारियासी ॥3॥ 3587 वृत्तीवरि आह्मां येणें काशासाटीं । एवढी हे आटी सोसावया ॥1॥ जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥ मोडूनि क्षरलों अभेदाची मूस । तुह्मां कां अळस वोडवला ॥2॥ तुका ह्मणे होइप लवकरि उदार । लांबणीचें फार काम नाहीं ॥3॥ 3588 सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥1॥ आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥ एका नेमें कोठें दुसरा पालट । पादिर तो धीट ह्मणती त्यासी ॥2॥ तुका ह्मणे किती बोलसी उणें । एकाच वचनें खंड करीं ॥3॥ 3589 जेथें माझी दृिष्ट राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळातें ॥1॥ टाळावी ते पीडा आपुल्यापासून । दिठावेलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥ तुम्हांसी कां कोडें कोणे ही विशीचें । नवलाव याचें वाटतसे ॥2॥ तुका ह्मणे वेगीं उभारा जी कर । कीर्त मुखें थोर गर्जइऩन ॥3॥ 3590 इच्छेपाशीं आलों फिरोनि मागुता । स्वामीसेवकता आवडीचे ॥1॥ द्यावें लवकरी मागितलें दान । मुळींचें जतन करूनि असें ॥ध्रु.॥ उपाय हे करीं एका चि वचना । दावूनियां खुणा ठाया येतों ॥2॥ तुका ह्मणे गांठी किती तुजपाशीं । जगाच्या तोडिसी चिंतनानें ॥3॥ 3591 कोठें आतां आह्मी वेचावी हे वाणी । कोण मना आणी जाणोनियां ॥1॥ न करावी सांडी आतां टाळाटाळी । देइन ये कळी होइल माजी ॥ध्रु.॥ घरोघरीं जाल्या Yाानाचिया गोष्टी । सत्यासवें गांठी न पडवी ॥2॥ तुका ह्मणे आह्मां भाकितां करुणा। भलता चि शाहाणा शोध काढी ॥3॥ 3592 डगमगी मन निराशेच्या गुणें । हें तों नारायणें सांतवीजे ॥1॥ धीरें तूं गंभीर जीवनें जगाचें । जळो विभागाचें आत्रीतत्या ॥ध्रु.॥ भेइऩल जीव हें देखोनि कठिण । केला जातो सीण तो तो वांयां ॥2॥ तुका ह्मणे आवश्यक हें वचन । पाळावें चि वान समयो आहे ॥3॥ 3593 आह्मी पाहा कैसीं एकतkव जालों । राखणे लागलों वासनेसी ॥1॥ तुह्मांविण कांहीं नावडावें जीवा । केला तो चि देवा केला पण ॥ध्रु.॥ वर्म नेणों परि वृत्ती भंगों नेदुं । वंदिलें चि वंदूं आवडीनें ॥2॥ तुका ह्मणे कळे नामाचें जीवन । वारता ही भिन्न नेणों आतां ॥3॥ 3594 आपण तों असा । समर्थ जी हृषीकेशा ॥1॥ करा करा बुझावणी । काय विलंब वचनीं ॥ध्रु.॥ हेंगे ऐसें ह्मणा । उठूनि लागेन चरणा ॥2॥ घेऊनियां सुखें । नाचेल तुका कवतुकें ॥3॥ 3595 द्याल ऐसें दिसे । तुमचें साचपण इच्छे ॥1॥ ह्मणऊनि न भंगे निर्धार । केलें लोचनें सादर ॥ध्रु.॥ मुखाची च वास । पुरला पाहे अवकाश ॥2॥ तुका ह्मणे कळे । काय लाभ कोण वेळ ॥3॥ 3596 तुह्मी तों सदैव । आधरपणें माझी हांव ॥1॥ जळो आशेचें तें जिणें । टोंकतसावें दीनपणें ॥ध्रु.॥ येथूनि सोडवा । आतां अनुभवेंसी देवा ॥2॥ तुका ह्मणे जालें । एक मग हें निमालें॥3॥ 3597 कैसें भलें देवा अनुभवा कां नये । उसीर तो काय तुह्मांपाशीं ॥1॥ आहे तें मागों तों दिसातें जवळी । केल्यामध्यें किळ कोण साध्य ॥ध्रु.॥ नाहीं सांडीत मी सेवेची मर्यादा । लाविला तो धंदा नित्य करीं ॥2॥ तुका ह्मणे हात आवरिला गुंती । माझे तंव चित्तीं नाहीं दुजें ॥3॥ 3598 हुंदकी पिसवी हलवी दाढी । मणी वोढी निंदेचे॥1॥ त्याचें फळ पाकीं यमाचे दंड । घर केलें कुंड कुंभपाक ॥ध्रु.॥ क्रोध पोटीं मांग आणिला अंतरा । भुंकोनि कुतरा जप करी ॥2॥ तुका ह्मणे स्नान केलें मळमूत्रें । जेवविलीं पितरें अमंगळें ॥3॥ 3599 अंगा भरला ताठा । नये वळणी जैसा खुंटा ॥1॥ कैसें न कळे त्या डेंगा । हित आदळलें अंगा ॥ध्रु.॥ जीव जाते वेळे । भरे लकडा ताठी डोळे ॥2॥ मुसळाचें धनु । तुका ह्मणे नव्हे अनु ॥3॥ 3600 करूनि कडविड । जमा घडिली लगड ॥1॥ आतां होतें तें चि जालें । नाम ठायींचें चांगलें ॥ध्रु.॥ उतरलें डाइप । उत्तम ते सुलाख ताइऩ ॥2॥ हिंडवितां देश । तुका ह्मणे नाहीं नाश ॥3॥ [[वर्ग:गाथा]] 5q4u5f95uk5ivt5x2vcoxgnnp7qqam6 तुकाराम गाथा/ ३६०१ ते ३९०० 0 1545 36908 36885 2026-09-19T19:41:52Z QueerEcofeminist 1879 [[वर्ग:गाथा]] जोडले [[c:Help:Cat-a-lot|कॅट-अ-लॉट]] वापरले 36908 wikitext text/x-wiki 3601 पढीयंतें मागा पांडुरंगापाशीं । मज दुर्बळासी काय पीडा ॥1॥ या चि साटीं दुराविला संवसार । वाढे हे अपार माया तृष्णा ॥ध्रु.॥ कांहीं करितां कोठें नव्हें समाधान । विचारितां पुण्य तें चि पाप ॥2॥ तुका ह्मणे आतां निश्चळ चि भलें । तुज आठविलें पांडुरंगा ॥3॥ 3602 नव्हे मी शाहाणा । तरी ह्मणा नारायणा ॥1॥ तुह्मां बोलवाया कांहीं । ये च भरलोंसे वाहीं ॥ध्रु.॥ आणावेति रूपा । कोपलेती तरी कोपा ॥2॥ कळोनि आवडी । तुका ह्मणे जाते घडी॥3॥ 3603 आह्मी भाविकें हे काय जाणों खोडी । आइकोनि प्रौढी विनविलें ॥1॥ नाहीं ऐसें येथें जालेती असतां । वाढविली चिंता अधिक सोसें ॥ध्रु.॥ न कळे चि आधीं करितां विचार । न धरितां धीर आहाचता ॥2॥ तुका ह्मणे आतां वचनें वचन । वाढले तिक्षीण बुिद्ध जाली ॥3॥ 3604 कोठें देवा बोलों । तुह्मां भीड घालूं गेलों ॥1॥ करावाया सkवहाणी । भांडवलाची टांचणी ॥ध्रु.॥ दुर्बळा मागतां । त्याच्या प्रवर्तला घाता ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । मज कळलें ऐसें कांहीं ॥3॥ 3605 काय त्या दिवस उचिताचा आला । मागील जो केला श्रम होता ॥1॥ ठेवियेला पूर्ण करूनि संकेत । तयापाशीं चित्त लागलें से ॥ध्रु.॥ जाणसी गे माते लेंकराचें लाड । नये पडों आड निष्ठ‍ता ॥2॥ तुका ह्मणे आह्मीं करावें वचन । तुह्मांसी जतन करणें तें ॥3॥ 3606 पडिला प्रसंग कां मी ऐसा नेणें । संकल्प ते मनें जिरवले ॥1॥ चेष्टाविलें तरी सांगावें कारणे । भHी ते उजेवन करावया ॥ध्रु.॥ लावूनियां दृिष्ट घेतली सामोरी । बैसलें जिव्हारीं डसोन तें ॥2॥ तुका ह्मणे जीवा लाविला तो चाळा । करावें गोपाळा शीघ्र दान ॥3॥ 3607 मागील विसर होइऩल सकळ । केली तळमळ दुःखाची ते ॥1॥ दोहींचें अहिक्य घालीं गडसंदीं । िस्थरावेल बुिद्ध पायांपाशीं॥ध्रु.॥ अहाच या केलों देहपरिचारें । तुमचें तें खरें वाटों नये ॥2॥ तुका ह्मणे व्हावें लवकरी उदार । मी आहें सादर प्रतिग्रहासी ॥3॥ 3608 वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥1॥ निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥ दिसे शोभिवंत सेवेनें सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीतिऩ ॥2॥ तुका ह्मणे आजी पाववा संतोष । करुनि कीतिऩघोष नाचइऩन ॥3॥ 3609 क्षोभ आणि कृपा मातेची समान । विभाग जतन करुनि ठेवी ॥1॥ क्षणभंगुर ते उपजली चिंता । खरी अखंडता आवडीची ॥ध्रु.॥ सिकवूं जाणे तें गोमाटियासाटीं । लोभें नाहीं तुटी निश्चयेंसी ॥2॥ अघवें चि मिथ्या समया आरतें । देता तो उचितें काळ जाणे ॥3॥ न करी वेव्हार नेदी गांजूं कोणा । भेडसावी तान्हें हाऊ आला ॥4॥ तुका ह्मणे करी जिवाची जतन। दचकूनि मन जवळी आणी ॥5॥ 3610 संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥1॥ हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥ध्रु.॥ लाज तेवढी नारायणीं। वांकडी वाणी पोरांपें ॥2॥ तुका ह्मणे बेशरमा । श्रमावरी पडिभरू॥3॥ 3611 मी त्यांसी अनन्य तीं कोणा असती । ऐसें तंव चित्तीं विचारावें ॥1॥ आहे तो विचार आपणयापाशीं । कळा बिंबाऐसी प्रतिबिंबीं ॥ध्रु.॥ शुभ शकून तो शुभ लाभें फळे । पुढील तें कळे अनुभवें ॥2॥ तुका ह्मणे माझा असेल आठव । तैसा माझा भाव तुझ्या पायीं ॥3॥ 3612 बहु कृपावंते माझीं मायबापें । मी माझ्या संकल्पें अंतरलों ॥1॥ संचितानें नाहीं चुकों दिली वाट । लाविलें अदट मजसवें ॥ध्रु.॥ आतां मी रुसतों न कळतां वर्म । परी ठावे धर्म सर्व देवा ॥2॥ तुका ह्मणे उभा राहिला न बैसे । आमची माय असे उद्वेग त्या ॥3॥ 3613 कैसीं दिसों बरीं । आम्ही आळवितां हरि ॥1॥ नाहीं सोंग अळंकार । दास जाला संवसार ॥ध्रु.॥ दुःख आह्मां नाहीं चिंता । हरिचे दास ह्मणवितां ॥2॥ तुका ह्मणे देवा । ऐसीं जळो करितां सेवा ॥3॥ 3614 आतां सांडूं तरी हातीं ना पदरीं । सखीं सहोदरीं मोकिळलों ॥1॥ जनाचारामध्यें उडाला पातेरा । जालों निलाजिरा ह्मणऊनि ॥ध्रु.॥ कोणाचिया दारा जावेनासें जालें । म्यां च विटंबिलें आपणासी ॥2॥ कां न जाला माझे बुद्धीसी संचार । नाहीं कोठें थार ऐसें जालें ॥3॥ तुका ह्मणे तुज भH जाले फार । ह्मणोनियां थार नाहीं येथें ॥4॥ 3615 जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥1॥ कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥ नव्हे चि तुह्मांस माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥2॥ भोग तंव जाला खरा भोगावया तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥3॥ कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतों कां जीवा तुका ह्मणे ॥4॥ 3616 कां जी आह्मां होतें दोषाचें दर्शन । तुज समर्पून देहभाव ॥1॥ पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरसील सत्ता सकळ ही ॥ध्रु.॥ कां जी आह्मांवरि आणिकांची सत्ता । तुह्मांसी असता जविळकें ॥2॥ तुका ह्मणे पायीं केलें निवेदन । उचित तें दान करीं सत्ता ॥3॥ 3617 निंदावें हें जग । ऐसा भागा आला भाग ॥1॥ होतें तैसें आलें फळ । गेलें निवडूनि सकळ ॥ध्रु.॥ दुस†याच्या मता । मिळेनासें जालें चित्ता ॥2॥ तुका जाला सांडा । विटंबिती पोरें रांडा ॥3॥ 3618 माझे माथां तुझा हात । तुझे पायीं माझें चित्त ॥1॥ ऐसी पडियेली गांठी । शरीरसंबंधाची मिठी ॥ध्रु.॥ येरयेरांपाशीं । सांपडोन गेलों ऐसीं ॥2॥ तुका ह्मणे सेवा । माझी कृपा तुझी देवा॥3॥ 3619 सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥1॥ नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥ध्रु.॥ मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥2॥ तुका ह्मणे जाण । तें च भल्याचें वचन॥3॥ 3620 माझिये बुद्धीचा खुंटला उपाव । करिसील काय पाहेन तें ॥1॥ सूत्रधारी तूं हें सकळचािळता । कासया अनंता भार वाहों ॥ध्रु.॥ वाहिले संकल्प न पवती सिद्धी । येऊं देहबुद्धीवरि नयों ॥2॥ तुका ह्मणे दुःखी करिती तरंग । चिंतूं पांडुरंग आवरून॥3॥ 3621 देखिलें तें धरिन मनें । समाधानें राहेन ॥1॥ भाव माझी सांटवण । जगजीवन कळावया ॥ध्रु.॥ बोळवीन एकसरें । उत्तरें या करुणेच्या ॥2॥ तुका ह्मणे नयों रूपा । काय बापा करीसी॥3॥ 3622 वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥1॥ माझें परिसावें गा†हाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥ हा चि आह्मां ठाव। पायीं निरोपाया भाव ॥2॥ तुका ह्मणे जार । तुझा तुज देवा भार॥3॥ 3623 खादलें च खावें वाटे । भेटलें भेटे आवडी ॥1॥ वीट नाहीं पांडुरंगीं । वाढे अंगीं आर्त तें ॥ध्रु.॥ इंिद्रयांची हांव पुरे। परि हें उरे चिंतन ॥2॥ तुका ह्मणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढें ॥3॥ 3624 सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि ॥1॥ न लगे कांहीं करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ध्रु.॥ ध्रु.॥ भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥2॥ तुका ह्मणे कृष्णनामें । शीतळ प्रेम सर्वांसी ॥3॥ 3625 ब्रीद याचें जगदानी । तो चि मनीं स्मरावा ॥1॥ सम पाय कर कटी । उभा तटीं भींवरेच्या ॥ध्रु.॥ पाहिलिया वेध लावी । बैसे जीवीं जडोनि ॥2॥ तुका ह्मणे भिHकाजा । धांवें लाजा लवलाहें ॥3॥ 3626 माझिया मनाची बैसली आवडी । अवसान घडी एकी नेघे ॥1॥ पाय चित्तीं रूप डोळांच राहिलें । चिंतने गोविलें मुख सदा ॥ध्रु.॥ अवघियांचा जाला विसर हा मागें । वेध हा श्रीरंगें लावियेला ॥2॥ तुका ह्मणे कानीं आइकली मात । तो चि जाला घात जीवपणा ॥3॥ 3627 याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥1॥ देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग ह्मणे ॥ध्रु.॥ एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥2॥ तुका ह्मणे याचे भेटी । जाली तुटी आपल्यांसी ॥3॥ 3628 दीन आणि दुर्बळांसी । सुखरासी हरिकथा ॥1॥ तारूं भवसागरींचें । उंचनीच अधिकार ॥ध्रु.॥ चरित्र तें उच्चारावें । केलें देवें गोकुळीं ॥2॥ तुका ह्मणे आवडी धरीं । कृपा करी ह्मणऊनी॥3॥ 3629 संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥1॥ तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥ सेवा करी साहे निष्ठ‍ उत्तरें । त्याचें वाहे मनीं तेंच बरें ॥2॥ तुका ह्मणे इच्छावसे खेळ खेळें । चिंता ते सकळ कांहीं नेणें ॥3॥ 3630 विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरि ॥1॥ आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥ मागें सारियेली युHी । कांहीं होती जवळी ते ॥2॥ निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥3॥ 3631 आतां येथें जाली जीवासवेंसाटी । होतें तैसें पोटीं फळ आलें ॥1॥ आतां धरिले ते नो सोडीं चरण । सांपडलें धन निजठेवा ॥ध्रु.॥ आतां हा अळस असो परता दुरी । नेदावी तें उरी उरों कांहीं ॥2॥ आतां याचा मज न व्हावा विसर । भरोनि अंतर राहों रूप ॥3॥ आतां लोकलाज नयो येथें आड । बहु जालें गोड ब्रह्मरस ॥4॥ तुका ह्मणे आतां जन्म हा सफळ । अंतरीं गोपाळ िस्थरावला ॥5॥ 3632 अनंतां जीवांचीं तोडिलीं बंधनें । मज हि येणें काळें कृपा कीजे ॥1॥ अनंत पवाडे तुझे विश्वंभरा । भHकरुणाकरा नारायणा ॥ध्रु.॥ अंतरींचें कळों देइप गुहए गुज । अंतरीं तें बीज राखइऩन ॥2॥ समदृष्टी तुझे पाहेन पाउलें । धरीन संचले हृदयांत॥3॥ तेणें या चित्ताची राहेल तळमळ । होतील शीतळ सकळ गात्रें ॥4॥ तुका ह्मणे शांति करील प्रवेश । मग नव्हे नाश अखंड तो ॥5॥ 3633 पराधीन माझें करूनियां जीणें । सांडीं काय गुणें केली देवा ॥1॥ उदार हे कीतिऩ असे जगामाजी । कां तें ऐसें आजि पालटिलें ॥ध्रु.॥ आळवितों परी न पुरे चि रीग । उचित तो त्याग नाहीं तुह्मां ॥2॥ तुका ह्मणे कां बा मुळीं च व्यालासी । ऐसें कां नेणसी पांडुरंगा ॥3॥ 3634 नेणपणें नाहीं केला हा बोभाट । आतां आली वाट कळों खरी ॥1॥ आतां बहुं शीघ्र यावें लवकरी । वाट पाहें हरी भेटी देइप ॥ध्रु.॥ समर्थाच्या बाळा करुणेचें भाषण । तरी त्याची कोण नांदणूक ॥2॥ तुका ह्मणे बहु बोलिले बडिवार । पडिलें अंतर लौकिकीं तें ॥3॥ 3635 जें जें केलें तें तें साहे । कैसें पाहें भाविक ॥1॥ ओंवाळूनि माझी काया । सांडिली यावरूनि ॥ध्रु.॥ काय होय नव्हें करूं । नेणें धरूं सत्ता ते ॥2॥ तुका ह्मणे कटीं कर । उभें धीर धरूनि ॥3॥ 3636 नाहीं मज कृपा केली पांडुरंगें । संताचिया संगें पोट भरीं ॥1॥ चतुराचे सभे पंडित कुशळ । मी काय दुर्बळ विष्णुदास॥2॥ तुका ह्मणे नेणें करूं समाधान । धरिले चरण विठोबाचे ॥3॥ 3637 तुह्मी माझा देवा करिजे अंगीकार । हा नाहीं विचार मजपाशीं ॥1॥ आतां दोहीं पक्षीं लागलें लक्षणें । देवभHपण लाजविलें ॥ध्रु.॥ एकांतीं एकलें न राहे निश्चळ । न राहे च पळ मन ठायीं ॥2॥ पायीं महत्वाची पडिली शंकळा । बांधविला गळा स्नेहा हातीं ॥3॥ शरीर सोकलें देखिलिया सुखा । कदान्न हें मुखा मान्य नाहीं ॥4॥ तुका ह्मणे जाला अवगुणांचा थारा । वाढली हे निद्रा अळस बहु ॥5॥ 3638 बोलिलिया गुणीं नाहीं पाविजेत । देवा नाहीं होत हित तेथें ॥1॥ कवतुक तुझें नवल यावरि । घेसील तें शिरीं काय नव्हे ॥ध्रु.॥ नाहीं मिळों येत संचिताच्या मता । पुराणीं पाहतां अघटित ॥2॥ तुका ह्मणे पायीं निरोपिला भाव । न्याल तैसा जाव सिद्धी देवा ॥3॥ 3639 हा तों नव्हता दीन । टाळायाच्या ऐसा क्षण ॥1॥ कां जी नेणों राखा हात । कैसें देखावें रडत ॥ध्रु.॥ दावूनियां आस । दूर पळविता कास ॥2॥ तुका ह्मणे धांव । घेतां न पुरे चि हांव ॥3॥ 3640 आर्तभूतां द्यावें दान । खरें पुण्य त्या नांवें ॥1॥ होणार तें सुखें घडो । लाभ जोडो महाबुिद्ध ॥ध्रु.॥ सत्य संकल्प च साटीं । उजळा पोटीं रविबिंब ॥2॥ तुका ह्मणे मनीं वाव । शुद्ध भाव राखावा ॥3॥ 3641 कवतुकवाणी बोलतसें लाडें । आरुष वांकडें करुनि मुख ॥1॥ दुजेपणीं भाव नाहीं हे आशंका । जननीबाळकामध्यें भेद ॥ध्रु.॥ सलगी दुरूनि जवळी पाचारूं । धांवोनियां करूं अंगसंग॥2॥ धरूनि पालव मागतों भातुकें । आवडीचें निकें प्रेमसुख ॥3॥ तुका ह्मणे तुज आमची च गोडी । ऐसी हे आवडी कळों आली ॥4॥ 3642 ऐकें पांडुरंगा वचन माझें एक । जालों मी सेवक दास तुझा ॥1॥ कळे तैसा आतां करावा उद्धार । खुंटला विचार माझा पुढें ॥ध्रु.॥ दंभ मान माझा करूं पाहे घात । जालिया ही थीत कारणाचा ॥2॥ हीन बुिद्ध माझी अधम हे याती । अहंकार चित्तीं वसों पाहे ॥3॥ तुका ह्मणे मज विघडतां क्षण । न लगे जतन करीं देवा ॥4॥ 3643 जेणें माझें चित्त राहे तुझ्या पायीं । अखंड तें देइप प्रेमसुख ॥1॥ देहभाव राख दीन करूनियां । जनाचारी वायां जाय तैसा ॥ध्रु.॥ द्रव्य दारा नको मानाची आवडी । कवणेविशीं गोडी प्रपंचाची ॥2॥ तुझें नाम माझें धरूनियां चित्त । एकांत लोकांत सदा राहो ॥3॥ तुका ह्मणे तुझे जडोनियां पायीं । जालों उतराइऩ पांडुरंगा ॥4॥ 3644 काय सांगों या संतांचे उपकार । मज निरंतर जागविती॥1॥ काय द्यावें त्यांचें व्हावें उतराइऩ । ठेवितां हा पायीं जीव थोडा ॥ध्रु.॥ सहज बोलणें हितउपदेश । करूनि सायास शिकविती॥2॥ तुका ह्मणे वत्स धेनुवेचा चित्तीं । तैसे मज येती सांभाळीत ॥3॥ 3645 देव जाणता देव जाणता । आपली च सत्ता एकाएकीं॥1॥ देव चतुर देव चतुर । जाणोनि अंतर वर्ततसे॥2॥ देव निराळा देव निराळा । अलिप्त विटाळा तुका ह्मणे ॥3॥ 3646 आपण चाळक बुद्धीच्या संचारा । आह्मांसी वेव्हारा पात्र केलें ॥1॥ काय जालें तरी नेघा तुह्मीं भार । आणीक कोणां थोर ह्मणों सांगा ॥ध्रु.॥ पंच भूतें तंव कर्माच्या या मोटा । येथें खरा खोटा कोण भाव ॥2॥ तुका ह्मणे नाहीं बोलावया जागा । कां देवा वाउगा श्रम करूं ॥3॥ 3647 एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीन ॥1॥ नेघावा जीं तुह्मी वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥ वेव्हारें आलें तें समानें चि होतें । बळ नाहीं येथें चालों येत ॥2॥ तुका ह्मणे आतां निवाडा च साटीं । संवसारें तुटी करुनि ठेलों ॥3॥ 3648 आतां येथें खरें । नये फिरतां माघारें ॥1॥ होइल हो तैसी आबाळी । देहनिमित्य या बळी ॥ध्रु.॥ तुह्मांसवें गांठी । देवा जीवाचिये साटीं ॥2॥ तुका नव्हे लंड । करूं चौघांमध्यें खंड॥3॥ 3649 कां हो वाडवितां देवा । मज घरी समजावा । केवडा हो गोवा । फार केलें थोडएाचें ॥1॥ ठेविन पायांवरी डोइऩ । यासी तुमचें वेचे काइऩ । जालों उतराइऩ । जाणा एकएकांचे ॥ध्रु.॥ निवाड आपणियांपाशीं । असोन कां व्हावें अपेसी । होती गांठी तैसी । सोडूनियां ठेविली ॥2॥ तुका ह्मणे गोड । होतें जालिया निवाड । दर्शनें ही चाड । आवडी च वाढेल ॥3॥ 3650 नव्हों सभाधीट । समोर बोलाया नीट । एकलीं एकट । दुजें नाहीं देखिलें ॥1॥ आतां अवघें तुम्हीं जाणां । तुमचें माझें नारायणा । येइऩल करुणा । ते चि पहा तुह्मांसी ॥ध्रु.॥ ताळ नाहीं माझे बुद्धी । धरली न धरवे शुद्धी । आतां बळें कधीं । कोण्या जन्में निवाड ॥2॥ आतां शेवटीचें । उत्तर तें हें चि साचें । शरण आलें त्याचें । तुका ह्मणे सांभाळा ॥3॥ 3651 ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥1॥ मागत्याची टाळाटाळी । झिंज्या ओढोनि कपाळीं ॥ध्रु.॥ नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥2॥ तुका ह्मणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला ॥3॥ 3652 माझ्या कपाळाच्या गुणें । किंवा सरलेंसे नेणें ॥1॥ नये वचन बाहेरी । उभें तिष्ठतसें दारीं ॥ध्रु.॥ काय सांगायास वेचे। रींद आरंभीं ठायींचे ॥2॥ तुका ह्मणे किती । भीड धरावी पुढती ॥3॥ 3653 कांहीं एक तरी असावा आधार । कासयानें धीर उपजावा ॥1॥ ह्मणविल्यासाटीं कैसें पडे रुजु । धणी नाहीं उजू सन्मुख तो ॥ध्रु.॥ वेचल्या दिसांचा कोणावरी लेखा । घालावा हा सुखासुखा आह्मीं ॥2॥ नाहीं मनोगत तोंवरि हे देवा । तुका ह्मणे सेवा नेघीजे तों ॥3॥ 3654 मनाचिये साक्षी जाली सांगों मात । सकळ वृत्तांत आपला तो ॥1॥ तुह्मां परामृश घेणें सत्ताबळें । धरितां निराळें कैसीं वांचों ॥ध्रु.॥ मी माझें सांडून यावया पसारा । आणीक दातारा काय काज ॥2॥ तुका ह्मणे आह्मी तुजविण एका । निढळें लौकिका माजी असों ॥3॥ 3655 घालूनि लोळणी पडिलों अंगणीं । सिंचा सिंचवणी तीर्थ वरि ॥1॥ वोल्हावेल तनु होइऩल शीतळ । जाली हळहळ बहुतापें ॥ध्रु.॥ पावेन या ठाया कइप जालें होतें । आलों अवचितें उष्टएावरि ॥2॥ तुका ह्मणे कोणी जाणवा राउळी । येइल जवळी पांडुरंग ॥3॥ 3656 तरीं भलें वांयां गेलों । जन्मा आलों मागुता । ह्मणऊनि ठेलों दास । सावकास निर्भयें ॥1॥ उणें पुरें काय माझें। त्याचें ओझें तुह्मांसी ॥ध्रु.॥ सांभाळावें तें म्या काइऩ । अवो आइऩ विठ्ठले । मागें जया जाइऩ नें स्थळा । तुज गोपाळा विसरेंना ॥2॥ आपलें म्यां एकसरें । करुनि बरें घेतलें । तुका ह्मणे नारायणा । आतां जाणां आपुलें ॥3॥ 3657 उरलें तें भिHसुख । डोळां मुख पाहावें । अंतरींचें कां हों नेणां । नारायणा माझिये ॥1॥ पुरवां तैसी केली आळी । बळी जगदानियां ॥ध्रु.॥ हातीं घेउनि चोरां भातें । दावां रितें बाळका। साजतें हें थोरपण । नाहीं विण वत्सळा ॥2॥ शाहणें तरीं लाड दावी । बाळ जेवीं मातेसी । तुका ह्मणे पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥3॥ 3658 धरूनि हें आलों जीवीं । भेटी व्हावी विठोबासी॥1॥ संकल्प तो नाहीं दुजा । महाराजा विनवितों ॥ध्रु.॥ पायांवरि ठेविन भाळ । येणें सकळ पावलें ॥2॥ तुका ह्मणे डोळेभरी । पाहिन हरी श्रीमुख ॥3॥ 3659 तुह्मां उद्धरणें फार । मज दुसरी नाहीं थार ॥1॥ आतां जैसें तैसें सोसा । काय करणें हृषीकेशा ॥ध्रु.॥ बरें न दिसेल ओळी । एका अन्न एका गाळी ॥2॥ लावितो आभार । तुका विखरलेती फार ॥3॥ 3660 न कळे जी भHी काय करूं सेवा । संकोचोनि देवा राहिलोंसे ॥1॥ जोडोनियां कर राहिलों निवांत । पायांपाशीं चित्त ठेवूनियां ॥ध्रु.॥ दिशाभुली करीं स्थळीं प्रदक्षणा । भ्रमें नारायणा कष्टविलें ॥2॥ तुका ह्मणे जालों आYोचा पाळक । जीवनासी एक ठाव केला ॥3॥ 3661 एकविध वृित्त न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति ॥1॥ कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें सािक्षत्वेसी ॥ध्रु.॥ न राहे निश्चळ जागवितां मन । किती क्षीणेंक्षीणें सावरावें ॥2॥ तुका ह्मणे बहु केले वेवसाव । तेणें रंगें जीव रंगलासे ॥3॥ 3662 आतां सोडवणें न या नारायणा । तरि मी न वंचे जाणा काळा हातीं ॥1॥ ऐसें सांगोनिया जालों उतराइऩ । आणीक तें काइऩ माझे हातीं ॥ध्रु.॥ केलियाचें माप नये सेवटासी । करितील नासि अंतराय ॥2॥ तुका ह्मणे भय वाटतसे जीवा । धांवणिया धांवा लवकरी ॥3॥ 3663 सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥1॥ उतरे तें कळें कसी । विखरोणें सर्वदेशीं ॥ध्रु.॥ घरामध्ये राजा । नव्हे हो वा पाटपूजा ॥2॥ तुका ह्मणे साचें । रूप तें दर्पणाचें॥3॥ 3664 नाहीं खंड जाला । माझा तुमचा विठ्ठला ॥1॥ कैसें कैसें हो दुिश्चत । आहे चौघांपाशीं नीत ॥ध्रु.॥ मुळींचे लिहिलें । मज आतां सांपडलें ॥2॥ तुका ह्मणे मज । न लगे बोलणें सहज॥3॥ 3665 हेचि वादकाची कळा । नाहीं येऊं येत बळा ॥1॥ धीर करावा करावा । तरी तो आहे आह्मां देवा ॥ध्रु.॥ रिघावें पोटांत। पायां पडोन घ्यावा अंत ॥2॥ तुका ह्मणे वरि । गोडा आणावा उत्तरीं ॥3॥ 3666 एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगडें ॥1॥ कपाळास लागली अगी । अभागी कां जीतसे ॥ध्रु.॥ एक परि बरें वेडें । ताकिऩक कुडें जळो तें ॥2॥ तुका ह्मणे खातडवासी । अमृतासी नोळखे ॥3॥ 3667 खेळों मनासवें जीवाच्या संवादें । कौतुक विनोदें निरांजनी ॥1॥ पचीं पडिलें तें रुचे वेळोवेळां । होतसे डोहळा आवडीस ॥ध्रु.॥ एकांताचें सुख जडलें जिव्हारीं । वीट परिचारीं बरा आला ॥2॥ जगाऐसी बुिद्ध नव्हे आतां कदा । लंपट गोविंदा जालों पायीं ॥3॥ आणीक ते चिंता न लगे करावी । नित्य नित्य नवी आवडी हे ॥4॥ तुका ह्मणे धडा राहिला पडोन । पांडुरंगीं मन विसांवलें ॥5॥ 3668 उचिताचा काळ । साधावया युिHबळ । आपलें सकळ । ते प्रसंगीं पाहिजे ॥1॥ नेम नाहीं लाभ हानि । अवचित घडती दोनी । विचारूनि मनीं । पाहिजे तें प्रयोजावें ॥ध्रु.॥ जाळ जाळा काळें । करपों नेदावें आगळें । जेवितां वेगळें । ज्याचें त्याचें तेथें तें शोभे ॥2॥ पाळी नांगर पाभारीं । तन निवडूनि सोंकरी । तुका ह्मणे धरी । सेज जमा सेवटीं ॥3॥ 3669 पडिलिया ताळा । मग अवघा चि निर्वाळा । तेथें कोणी बळा । नाहीं येत कोणासी ॥1॥ जोडिलें तें लागें हातीं । आपआपली नििंश्चती । हर्ष आणि खंती । तेथें दोनी नासलीं ॥ध्रु.॥ सहज सरलिया कारणें । मग एकला आपण । दिसे तरी भिन्न । वचनाचा प्रसंग ॥2॥ करूनि झाडा पाडा । तुका वेगळा लिगाडा। नििंश्चतीच्या गोडा । गोष्टी ह्मुण लागती ॥3॥ 3670 जीविता तो माझा पिता । उखता तो उखत्यांचा॥1॥ जनादऩनीं सरती कर्में । वाते भ्रमे अनेत्र । अपसव्य सव्यामधीं । ऐसी शुद्धी न धरितां ॥2॥ तुका ह्मणे खांद्या पानें । सिंचतां भिन्न कोरडी॥3॥ 3671 माउलीची चाली लेंकराचे ओढी । तयालागीं काढी प्राणें प्रीती ॥1॥ ऐसी बिळवंत आवडी जी देवा । संतमहानुभावा विनवितों ॥ध्रु.॥ मोहें मोहियेलें सर्वकाळ चित्त । विसरु तो घेत नाहीं क्षणें ॥2॥ तुका ह्मणे दिला प्रेमाचा वोरस । सांभािळलें दास आपुलें तें ॥3॥ 3672 केवढा तो अहंकार । माझा तुह्मां नव्हे दूर ॥1॥ आतां कोण पडे पायां । तुमच्या अहो पंढरिराया ॥ध्रु.॥ कां जी कृपेनें कृपण । वेचत असे ऐसें धन ॥2॥ तुका ह्मणे देवें । दुजियाचें पोतें न्यावें ॥3॥ 3673 अपराधी ह्मणोनि येतों काकुलती । नाहीं तरी होती काय चाड ॥1॥ येइल तारूं तरी तारा जी देवा । नाहीं तरी सेवा घ्या वो भार ॥ध्रु.॥ कासया मी आतां वंचूं हे शरीर । आहें बारगीर जाइप जनें ॥2॥ तुका ह्मणे मन करूनि मोकळें । आहें साळेंढाळें उदार मी ॥3॥ 3674 माझे तों फुकाचे कायेचे चि कष्ट । नव्हे क्रियानष्ट तुह्मांऐसा ॥1॥ कांहीं च न वंचीं आजिचा प्रसंगीं । सकळा ही अंगीं करीन पूजा ॥ध्रु.॥ द्यावें काहीं तुह्मीं हें तों नाहीं आस । असों या उदास देहभावें ॥2॥ तुका ह्मणे माझी मावळली खंती । समाधान चित्तीं सर्वकाळ ॥3॥ 3675 स्वामीचिया सत्ता । आधीं वर्म येतें हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥1॥ करीं कवतुकाचे बोल । परि जिव्हाऑयाची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥ मनें मेळविलें मना । नाहीं अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरि दिल्या उमटोनि ॥2॥ नाहीं पराश्रमें काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥3॥ 3676 एके ठायीं अन्नपाणी । ग्रासोग्रासीं चिंतनीं ॥1॥ वेळोवेळां जागवितों । दुजें येइल ह्मुण भीतों ॥ध्रु.॥ नाहीं हीं गुंतत उपचारीं । मानदंभाचे वेव्हारीं ॥2॥ तुका जालासे शाहाणा । आड लपे नारायणा ॥3॥ 3677 वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥1॥ येथें नाहीं तर्कवितकाऩची चाड । होतसे निवाड ख†या खोटएां ॥ध्रु.॥ उगा च सारावा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥2॥ तुका ह्मणे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशातैसें॥3॥ 3678 समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥1॥ मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥ दयासिंधु तुह्मां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपापीयूषें ॥2॥ तुका ह्मणे अवो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥3॥ 3679 लेखिलें कवित्व माझे सहज बोल । न लगे चि ओल जिव्हाऑयाची ॥1॥ नये चि उत्तर कांहीं परतोनि । जालों नारायणीं न सरतें ॥ध्रु.॥ लाजिरवाणी कां वदली हे वाचा । नव्हे च ठायींचा मननशीळ ॥2॥ तुका ह्मणे फळ नव्हे चि सायासा । पंढरीनिवासा काय जालें ॥3॥ 3680 येणें जाला तुमचे पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥1॥ भरूनियां घरीं राहिलों वाखती । आपुली नििंश्चती आपल्यापें ॥ध्रु.॥ आतां काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥2॥ तुका ह्मणे कोठें पाहोंजासी आतां । माझी जाली सत्ता तुह्मांवरि ॥3॥ 3681 तुमच्या पाळणा ओढतसे मन । गेलों विसरोन आपणासी ॥1॥ लागेल पालटें फेडावें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥ध्रु.॥ तुमचे आवडी संबंधाचा त्याग । घेतला ये लाग जगनिंदेचा ॥2॥ तुका ह्मणे जैसा माझा जीव ओढे । तैसें च तिकडे पाहिजेल ॥3॥ 3682 नाहीं मज कोणी उरला दुर्जन । मायबापाविण ब्रह्मांडांत॥1॥ कासया जी माझी करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता संतीं ॥ध्रु.॥ विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । सत्तेनें तो चाळी आपुलिये ॥2॥ तुका ह्मणे माझें पाळणपोषण । करितां आपण पांडुरंगा ॥3॥ 3683 मज कांहीं सीण न व्हावा यासाटीं । कृपा तुह्मां पोटीं उपजलीं ॥1॥ होतें तैसें केलें आपलें उचित । शिकविलें हित बहु बरें ॥ध्रु.॥ आह्मी न मनावी कोणाची आशंका । तुह्मां भय लोकां आहे मनीं ॥2॥ तुका ह्मणे आतां संचिताचा ठेवा । वोडवला घ्यावा जैसा तैसा ॥3॥ 3684 कोणाचें चिंतन करूं ऐशा काळें । पायांचिया बळें कंठीतसें ॥1॥ पाहातसें वाट येइप गा विठ्ठला । मज कां हा केला परदेश ॥ध्रु.॥ बहुतांचे सत्ते जालों कासावीस । जाय रात्री दिस वैरियांचा ॥2॥ तुका ह्मणे बैसें मनाचिये मुळीं । तरीं च ही जाळीं उगवतीं ॥3॥ 3685 कां जी तुह्मीं ऐसे नव्हा कृपावंत । निवे माझें चित्त ठायिंच्या ठायीं ॥1॥ कांही शम नये विषम अंतरा । शांतीचा तो बरा ऐसा योग ॥ध्रु.॥ दुःखी होतों पंचभूतांच्या विकारें । जडत्वें दातारें राखावीं तीं ॥2॥ तुका ह्मणे मोडा अहंकाराची मान । धरितों चरण ह्मणऊनि ॥3॥ 3686 मागत्याची कोठें घडते निरास । लेंकरा उदास नाहीं होतें ॥1॥ कासया मी होऊं उतावीळ जीवीं । जाणता गोसावी सर्व आहे ॥ध्रु.॥ जाला तरी वेळ कवतुकासाटीं । निदऩया तों पोटीं उपजेना ॥2॥ तुका ह्मणे त्यासी ठाउकें उचित । होइऩल संकेत नेमियेला ॥3॥ 3687 आरुषा वचनीं मातेची आवडी । ह्मणऊनि तांतडी घेती नाहीं ॥1॥ काय होइल माझें मांडिलें कवतुक । आदराची भूक रडारोवी ॥ध्रु.॥ लपोनियां करी चुकुर माऊली । नाहीं होती केली निष्ठासांडी ॥2॥ तुका ह्मणे करी पारखीं वचनें । भेवउनि तान्हें आळवावें ॥3॥ 3688 प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्ट‍ता ॥1॥ जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥ काय जाणे तुटों मायेचें लिगाड । विषम तें आड उरों नेणें ॥2॥ तुका ह्मणे मज करुणा उत्तरें । करितां विश्वंभरे पाविजैल ॥3॥ 3689 नको घालूं झांसां । मना उपाधिवोळसा ॥1॥ जे जे वाहावे संकल्प । पुण्य तरी ते चि पाप ॥ध्रु.॥ उपजतो भेव । होतो कासावीस जीव ॥2॥ तुका ह्मणे पाहों । होइल तें निवांत राहों॥3॥ 3690 बीजीं फळाचा भरवसा । जतन सिंचनासरिसा । चाविलिया आसा । काकुलती ते नाड ॥1॥ हा तों गडसंदीचा ठाव। पिके पिकविला भाव । संकोचोनि जीव । दशा केली जतन ॥ध्रु.॥ माती घाली धनावरी । रांडा रोटा वरीवरी । सुखाचे सेजारीं। दुःख भ्रमें भोगीतसे ॥2॥ तुका ह्मणे दिशाभुली । जाल्या उफराटी चाली । निवाडाची बोली । अनुभवें साक्षीसी ॥3॥ 3691 काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥1॥ अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥ माझा मायबाप ये गेलों सलगी । तों हें तुह्मां जगीं सोयइरिका ॥2॥ तुका ह्मणे आतां जोडोनियां हात । करी दंडवत ठायिंचाठायीं ॥3॥ 3692 आवडी धरूनि करूं गेलों लाड । भिHप्रेमकोड न पुरे चि ॥1॥ ह्मणऊनि जीव ठेला असावोनि । खेद होतो मनीं बहु साल ॥ध्रु.॥ वेठीऐसें वाटे निर्फळ कारण । शीतळ होऊन खोडावलों॥2॥ तुका ह्मणे सरतें नव्हें चि पायांपें । बळ केलें पापें नव्हें चि भेटी ॥3॥ 3693 प्रीतीचा तो कळवळा । जिव्हाळाचि वेगळा ॥1॥ बहु नेदी रडों माता । दुिश्चत होतां धीर नव्हे ॥ध्रु.॥ वरी वरी तोंडापुरतें । मोहोरी तें कळतसे ॥2॥ जाणोनियां नेणता तुका । नव्हे लोकांसारिखा ॥3॥ 3694 हा गे हा चि आतां लाहो । माझा अहो विठ्ठला॥1॥ दंडवत दंडवत । वेगळी मात न बोलें ॥ध्रु.॥ वेगळाल्या कोठें भागें। लाग लागें लावावा ॥2॥ तुका ह्मणे केल्या जमा । वृित्ततमा भाजूनि ॥3॥ 3695 तुह्मांसी न कळे सांगा काय एक । असया संकल्प वागवूं मी ॥1॥ आहे तेथें सत्ता ठेविलें स्थापूनि । प्रमाणें चि वाणी वदे आYाा ॥ध्रु.॥ कृपा जाली मग न लगे अंगसंग । निजध्यासें रंग चढता राहे ॥2॥ तुका ह्मणे मागें बोलिलों तें वाव । आतां हा चि भाव दृढ झाला ॥3॥ 3696 आवडी न पुरे मायबापापासीं । घडों का येविसीं सकइऩल ॥1॥ होइऩल नेमलें आपुलिया काळें । आलीयाचा बळें आघ्रो उरे ॥ध्रु.॥ जाणविलें तेथे थोडें एकवेळा । सकळ ही कळा सवाौत्तमीं ॥2॥ तुका ह्मणे निवेदिलें गुहए गुज । आतां तुझी तुज सकळ चिंता ॥3॥ 3697 वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥1॥ किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥ आतां कोण याचा करील आदर । जावो किळवर विटंबोनि ॥2॥ तुका ह्मणे आतां सांडि तें चि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागें ॥3॥ 3698 हें ही ऐसें तें ही ऐसें । उभय पिसें अविचार ॥1॥ अभिमानाचे ठेलाठेलीं । मधीं जाली हिंपुष्टी ॥ध्रु.॥ धीरा शांती ठाव नुरे । हा चि उरे आबाऑया ॥2॥ कौतुक हें पाहे तुका । कढतां लोकां अधनि ॥3॥ 3699 हित जाणे चित्त । कळों येतसे उचित ॥1॥ परिहार ते संपादनी । सत्य कारण कारणीं ॥ध्रु.॥ वरदळ तें नुतरे कसीं । आगीमध्यें तें रसीं ॥2॥ तुका ह्मणे करुनी खरें । ठेवितां तें पुढें बरें॥3॥ 3700 देवें दिला देह भजना गोमटा । तों या जाला भांटा बाधिकेच्या ॥1॥ ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नल्हे ॥ध्रु.॥ दास ह्मणावया न वळे रसना । सइरवचना बासे गळा ॥2॥ तुका ह्मणे कोठें ठेवावा विटाळ । स्नानें नीर्मळ व्हावयासी ॥3॥ 3701 काय करूं पोरा लागली चट । धरी वाट देउळाची॥1॥ सांगितलें नेघे कानीं । दुजें मनीं विठ्ठल ॥ध्रु.॥ काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुिश्चत ॥2॥ आमचे कुळीं नव्हतें ऐसें । हें च पिसें निवडलें ॥3॥ लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें ॥4॥ तुका ह्मणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टांचीं ॥5॥ 3702 कारणापें असतां दृष्टी । शंका पोटीं उपजेना ॥1॥ शूर मिरवे रणांगणीं । मरणीं च संतोष ॥ध्रु.॥ पाहिजे तो कळवळा। मग बळा काय उणे ॥2॥ तुका ह्मणे उदारपणें । काय उणें मनाचें॥3॥ 3703 नव्हती हे उसणे बोल । आहाच फोल रंजवण॥1॥ अनुभव तो वरावरी । नाहीं दुरी वेगळा ॥ध्रु.॥ पाहिजे तें आलें रुची।काचाकुची काशाची ॥2॥ तुका ह्मणे लाजे आड । त्याची चाड कोणासी ॥3॥ 3704 जों जों घ्यावा सोस । माझे वारीं गर्भवास । लटिक्याचा दोष । अधिक जडे अंगेसीं ॥1॥ आतां आहे तैसें असो । अनुताप अंगीं वसो । येवढें चि नसो । माझें आणि परावें ॥ध्रु.॥ जागाजालेपणें। काय नासावें स्वप्न । शब्दाचिया शिणें । कष्ट मिथ्या मानावे ॥2॥ छाये माकड विटे । धांवे कुपीं काय भेटे । तुका ह्मणे फुटे । डोइऩ गुडघे कोंपर ॥3॥ 3705 गुणांचा चि सांटा । करूं न वजों आणिका वाटा॥1॥ करिती छंद नानापरी । भरोन सिणती आडभरी ॥ध्रु.॥ नेमली पंगती। आह्मां संतांची संगती ॥2॥ तुका ह्मणे लीळा । येर कवतुक पाहों डोळां ॥3॥ 3706 शिकल्या शब्दाचें उत्पादितों Yाान । दरपणींचें धन उपर वाया ॥1॥ अनुभउ कइं होइऩन भोगिता । सांकडें तें आतां हें चि आलें ॥ध्रु.॥ गायें नाचें करीं शरीराचे धर्म । बीजकळावर्म तुमचें दान ॥2॥ तुका ह्मणे केला उशीर न साहे । द्याल तरी आहे सर्व सिद्ध ॥3॥ 3707 सिकविला तैसा पढों जाणे पुसा । कैंची साच दशा तैसी अंगीं । स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥1॥ कासया हा केला जिहुवे अळंकार । पायांसी अंतर दिसतसे ॥ध्रु.॥ दर्पणींचें धन हातीं ना पदरीं । डोळां दिसें परी सत्याचिये । आस केली तरी लाळ चि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥2॥ कवित्वें रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणीं घडे ऐसी । तुका ह्मणे गुरें राखोनि गोंवारी । माझीं ह्मणे परि लाभ नाहीं ॥3॥ 3708 अनुभव तो नाहीं अमुचिया दरषणें । अइकिलें कानें वदे वाणी । जेविल्याचा कैसा अनुभव अंतरीं । ह्मणतां मांडे पुरी काय होतें ॥1॥ नाहींनाहीं गेली तळमळ दातारा । कां जी हरिहरा चाळविलें ॥ध्रु.॥ पत्रीं कुशळता भेटी अनादर । काय तें उत्तर येइल मानूं । अंतरीं सबाहएीं कां नाहीं सारिखें । धरूनि पारिखें वर्त्ततसां॥2॥ आलों आलों ऐसी दाऊनियां आस । वाहों बुडतयास काय द्यावें । तुका ह्मणे अहो चतुरा शिरोमणि । किती माझी वाणी तुह्मी कोठें॥3॥ 3709 केलें तरी आता साच चि करावें । विचारिलें द्यावें कृपादान ॥1॥ संकल्पासी नाहीं बोलिला विकल्प । तुह्मां पुण्यपाप कळे देवा ॥ध्रु.॥ उदार शिH तंव तुमची भूमंडळीं । ऐसी िब्रदावळी गर्जतसे ॥2॥ तुका ह्मणे अहो रकुमादेवीवरा । उपरोध कां धरा माझा आतां ॥3॥ 3710 अहो पुरुषोत्तमा । तुह्मां काशाची उपमा ॥1॥ सतंत तो नाहीं बुद्धी । नाळवितां नाहीं शुिद्ध ॥ध्रु.॥ जागविलें तरी । तुह्मां वेिHयेणें हरी ॥2॥ तुका ह्मणे देवा । तुम्हा नित्य दिस नवा॥3॥ 3711 मथनें भोगे सार । ताकें घडे उपकार ॥1॥ बरवी सायासाची जोडी । अनुभविया ठावी [[गोड]]ी ॥ध्रु.॥ पाक आणि रुचि। जेथें तेथें ते कइंची ॥2॥ वाढितो पंगती । तुका आवडी संगती ॥3॥ 3712 चिंतनाची जोडी । हा चि लाभ घडोघडी ॥1॥ तुह्मी वसूनि अंतरीं । मज जागवा निर्धारीं ॥ध्रु.॥ जाय जेथें मन । आड घाला सुदर्शन ॥2॥ तुका ह्मणे भोजें । नाचें हो ऐसें न लजें ॥3॥ 3713 आवडीची न पुरे धणी । प्रीत मनीं बैसली ॥1॥ नित्य नवा कळवळा । मायबाळामध्यें तों ॥ध्रु.॥ सुख सुखा भेटों आलें । होय वाल्हें पोटींचे ॥2॥ तुका ह्मणे ब्रह्मानंदें । संतवृंदें चरणापें ॥3॥ 3714 जडलों तों आतां पायीं । होऊं काइऩ वेगळा ॥1॥ तुम्हीं संतीं कृपा केली । गंगे चाली ओघाची ॥ध्रु.॥ सांभािळलों मायबापा । केलों तापावेगळा ॥2॥ वोरसें या जीव धाला । तुका ठेला मौन्य चि ॥3॥ 3715 काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥1॥ तो मी हीणाहूनि सांडें । देवे दु†हें काळतोंडें ॥ध्रु.॥ मानूनी भर्वसा । होतों दासा मी ऐसा ॥2॥ तुका ह्मणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥3॥ 3716 समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥1॥ आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥ निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे॥2॥ तुका ह्मणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीतिऩ ॥3॥ 3717 बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥1॥ आतां धरीन पदरीं । करीन तुज मज सरी ॥ध्रु.॥ जालों जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥2॥ तुका विनवी संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा॥3॥ 3718 नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥1॥ सर्प शांतिरूप न ह्मणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥2॥ तुका ह्मणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥3॥ 3719 मज अभयदान देइऩ दातारा । कृपेच्या सागरा मायबापा॥1॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥ सेवाभिHहीन नेणता पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥2॥ तुका ह्मणे माझें सर्व ही साधन । नाम संकीर्तन विठोबाचें ॥3॥ 3720 करावा वर्षाव । तृषाक्रांत जाला जीव ॥1॥ पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगनिवास ॥ध्रु.॥ संयोगें विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥2॥ तुका ह्मणे फळें । चरणांबुजें तीं सकळें॥3॥ 3721 करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें ॥1॥ मग तो माझा मायबाप । घेइल ताप हरूनी ॥ध्रु.॥ बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥2॥ तुका ह्मणे करुणाबोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥3॥ 3722 एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥1॥ अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥ कायावाचामन। स्वरूपीं च अनुसंधान । लक्ष भेदी बाण । येणे पाडें लवलाहो॥2॥ तुका ह्मणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा । देउनियां धीरा । मिठी जाणा जागृतीं ॥3॥ 3723 हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥1॥ नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥ अवघा रुधविला ठाव। नेला वाव मी माझें ॥2॥ तुका ह्मणे एके ठावीं । असूं नाहीं सीनाभिन्न ॥3॥ 3724 पाहा कैसेकैसे । देवें उद्धरिले आनयासें ॥1॥ ऐका नवल्याची ठेव । नेणतां भिHभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥2॥ पांखांच्या फडत्कारीं । उद्धरुनी नेली घारी ॥3॥ खेचरें पिंडी दिला पाव । त्या पूजनें धाये देव ॥4॥ तुका ह्मणे भोळा । स्वामी माझा हो कोंवळा ॥5॥ 3725 अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥1॥ पाठी बैसली सेजारीं । नव्हे शांत कोणे परी ॥ध्रु.॥ कोठें न लगे जावें । कांहीं घालावया ठावें ॥2॥ तुका ह्मणे कोटि । दुःखाच्या च तये पोटीं ॥3॥ 3726 पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥1॥ संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ध्रु.॥ मोटचौफळ । अंतीं उिच्छष्टाचें बळ ॥2॥ न संडीं मारग । येथें न चोरूनि अंग॥3॥ आपुलिया सत्ता । चालविती नाहीं चिंता ॥4॥ कळविळला तुका । घराचार येथें नका ॥5॥ 3727 मागें पुढें जालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥1॥ नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥ पोसिंद्याचे पडिलों हातीं । वोझें माती चुकली ॥2॥ जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरि नाहीं ॥3॥ अवघिया मोकऑया दिशा । नाहीं वोळसा कामाचा॥4॥ संताचिये लोळें द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥5॥ कांहीं न साहेसा जाला । तुका नेला समर्थ ॥6॥ पातोगें महाद्वारीं। वरि झुली वाकळा ॥7॥ 3728 करणें न करणें वारलें जेथें । जातों तेणें पंथें संतसंगें॥1॥ संतीं हें पहिलें लाविलें निशाण । ते खुणा पाहोन गर्जें नाम ॥2॥ तुका ह्मणे तुह्मीं चला या चि वाटे । भरवशानें भेटे पांडुरंग ॥3॥ 3729 कइंचें कारण । तृष्णा वाढविते सीण ॥1॥ काय करूनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥ रूपीं नाहीं गोडी । हांवे हांवे उर फोडी ॥2॥ तुका न पडे भरी । ऐशा वरदळाचे थोरी॥3॥ 3730 धन्य तो ग्राम जेथें हरिदास । धन्य तो चि वास भाग्य तया ॥1॥ ब्रह्मYाान तेथें असे घरोघरीं । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥ध्रु.॥ नाहीं पापा रिघ काळाचें जीवन । हरिनामकीर्त्तन घरोघरीं ॥2॥ तुका ह्मणे तिहीं तारिलें सकळां । आपल्या कोटिकुळासहित जीव ॥3॥ 3731 मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥1॥ एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥ नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य जालें ॥2॥ तुका ह्मणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥3॥ 3732 भय होतें आह्मीपणें । पाठी येणें घातलें ॥1॥ अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥ समर्थाचें नाम घेतां । मग चिंता काशाची ॥2॥ तुका ह्मणें नारायणें । जालें जिणें सुखाचें ॥3॥ 3733 विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥1॥ मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्वेग ॥ध्रु.॥ होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥2॥ तुका ह्मणे आहे । बुद्धी केलियानें साहे । जवळी च पाहें । देव वाट स्मरणाची ॥3॥ 3734 आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥1॥ भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥ प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥2॥ तुका ह्मणे आह्मां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥3॥ 3735 विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥1॥ जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकास ॥ध्रु.॥ व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥2॥ जनीं जनादऩन । संत बोलती वचनें ॥3॥ सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥4॥ 3736 निरोधती परि न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥1॥ राहातेति तुह्मी भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निविऩषचि ॥ध्रु.॥ कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥2॥ तुका ह्मणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायापाशीं हे चि करीं ॥3॥ 3737 अद्वय चि द्वय जालें चि कारण । धरिलें नारायणें भिHसुख ॥1॥ अपरोक्ष आकार जाला चतुर्भुज । एकतkव बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥ शून्य निरशुन्यी राहिलें निर्मळ । तें दिसे केवळ इटेवरी ॥2॥ सुखें घ्यावें नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी ॥3॥ तुका ह्मणे मी च आहें तेणें सुखें । भेद नाहीं मुखें नाम गातों ॥4॥ 3738 उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥1॥ सर्वसिद्धीचा दातार । सवें आणिला परिवार । भH अभयंकर । घ्याघ्या ऐसें ह्मणतसे ॥ध्रु.॥ जेणें हें विश्व निमिऩलें । महर्षीदेवा संस्थापिलें । एकवीस स्वर्गांतें धरिलें । सत्तामात्रें आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे कृपावंत । इिच्छले पुरवी अर्थ। रििद्धसििद्धमुHी देतसे । शेखीं संग आपुला ॥3॥ 3739 सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥1॥ वरकड कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥ षड्गुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंतीं जाण ॥2॥ तुका ह्मणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥3॥ 3740 वैकुंठींचें सुख पंढरिये आलें । अवघें पुंडलिकें सांटविलें ॥1॥ घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे ॥ध्रु.॥ विषय गुंडोनी ठेवीं पसारा । मग धांव घ्या पंढरपुरा ॥2॥ जंव आहे आयुष्याचा लेश। तंव करीं पंढरीचा वास ॥3॥ अळस न करीं लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥4॥ 3741 देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥1॥ हातावरि हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥2॥ तुका ह्मणे थुंका त्याच्या तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥3॥ 3742 अद्वैतीं तों माझें नाहीं समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥1॥ करूनी उचित देइप हें चि दान । आवडे कीर्तन नाम तुझें॥ध्रु.॥ देवभHपण सुखाचा सोहळा । ठेवुनी निराळा दावी मज ॥2॥ तुका ह्मणे आहे तुझें हें सकळ । कोणी एके काळें देइप मज ॥3॥ 3743 हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥1॥ हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥ हा चि माझा धर्म हें चि माझें कर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥2॥ हा चि माझा योग हा चि माझा यYा । हें चि जपध्यान नाम तुझें ॥3॥ हें चि माझें Yाान श्रवण मनन । हें चि निजध्यासन नाम तुझे ॥4॥ हा चि कुळाचार हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥5॥ हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥6॥ तुका ह्मणे दुजें सांगायासि नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥7॥ 3744 कोण साक्षीविण । केलें उद्धारा भजन ॥1॥ ऐसें सांगा जी दातारा । माझी भिH परंपरा ॥ध्रु.॥ कोणें नाहीं केली आळी । ब्रह्मYाानाहुनि वेगळी ॥2॥ कोणाचें तों कोड । नाहीं पुरविला लाड ॥3॥ कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा॥4॥ तुका ह्मणे भिन्न । कांहो बोले साक्षीविण ॥5॥ 3745 सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥1॥ बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥ध्रु.॥ जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥2॥ तुका ह्मणे दासां । देव सरिसासरिसा॥3॥ 3746 चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट ॥1॥ ह्मणउनी गर्भवास । नेणती ते हरिचे दास ॥ध्रु.॥ संचिताचा संग । काय जाणों पावें भंग ॥2॥ तुका ह्मणे दृष्टी उघडितों नव्हे कष्टी ॥3॥ 3747 कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें॥1॥ आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । किळवरें तुटी जाल्या त्वरे ॥ध्रु.॥ सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळें देवा मन जालें ॥2॥ पाउलापाउलीं करितां विचार । अनंतविकार चित्ता अंगीं ॥3॥ ह्मणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसें कींव अटाहासें ॥4॥ तुका ह्मणे होइल आइकिलें कानीं । तरि चक्रपाणी धांव घाला ॥5॥ दुःखाच्या उत्तरीं आळविले पाय । पाहणें तों काय अजून अंत ॥6॥ 3748 कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥1॥ तुह्मां शिरीं होता भार । आह्मां कैचा संचार ॥ध्रु.॥ होतें अभयदान । तरी िस्थर होतें मन ॥2॥ तुका ह्मणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥3॥ 3749 वारंवार हा चि न पडावा विसर । वसावें अंतर तुमच्या गुणीं ॥1॥ इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥ लाभाचिये वोढी उताविळें मन । त्यापरि चिंतन चरणाचें ॥2॥ तुका ह्मणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आतां ॥3॥ 3750 आइका माझीं कवतुकउत्तरें । देउनी सादरें चित्त देवा॥1॥ वोरसें आवडी आलों पायापासीं । होय तें मनेसीं सुख कीजे ॥ध्रु.॥ तुमचें न भंगे सवाौत्तमपण । करितां समाधान लेंकराचें॥2॥ तुका ह्मणे जरी बोलतों बोबडें । तरी वाडे कोडें कवतुक ॥3॥ 3751 जन्मा आलियाचा लाभ । पद्मनाभदरुषणें ॥1॥ पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥ध्रु.॥ कोण्या उपायें हें घडे । भव आंगडें सुटकेचें ॥2॥ बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥3॥ तुका ह्मणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥4॥ 3752 नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं वरावरी ॥1॥ निकटवासिया आळवितों धांवा । तेथूनियां देवा सोडवूनी ॥ध्रु.॥ उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घालीं ॥2॥ तुका ह्मणे तरि वांचलों या काळें । समर्थाचे बळें सुखी असों ॥3॥ 3753 आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥1॥ तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुिद्ध हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥ भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवें अन्ना । भुकों पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥2॥ काय जिंकियेलें मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भHी तुका ये जाती ॥3॥ 3754 न पवीजे तया ठाया । आलों कायाक्लेशेसीं ॥1॥ आतां माझें आणीं मना । नारायणा ओजेचें ॥ध्रु.॥ बहु रिणें पिडिलों फार । परिहार करावा ॥2॥ तुका ह्मणे निर्बळशिH । काकुलती म्हुण येतों ॥3॥ 3755 बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना ॥1॥ समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरि ॥ध्रु.॥ घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥2॥ तुका ह्मणे जेवूं आधी । खवखव मधीं सारावी ॥3॥ 3756 कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया॥1॥ तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ध्रु.॥ नांवासाटीं नेघें भार । न लगे फार वित्पित्त ॥2॥ तुका ह्मणे न लगे जावें । कोठें देवें सुचनें ॥3॥ 3757 इंिद्रयाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही ॥1॥ जावें म्हणती पंढरपुरा । हा चि बरा संसार ॥ध्रु.॥ बैसलें तें मनामुळीं । सुख डोळीं देखिलें ॥2॥ तुका ह्मणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥3॥ 3758 आतां देवा मोकिळलें । तुह्मी भलें दिसेना ॥1॥ आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥ सांभाळुन घ्यावें देवा । आपणासवा यावरि ॥2॥ तुका ह्मणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥3॥ 3759 आशाबद्ध आह्मी भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥1॥ प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥ आपुल्या उचितें करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥2॥ तुका ह्मणे एक जालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥3॥ 3760 खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥1॥ आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥ खाणार ताकाचें आसातें माजीरें । आपणें चि अधीर कळों येतें ॥2॥ तुका ह्मणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥3॥ 3761 नाहीं सरों येत कोरडएा उत्तरीं । जिव्हाऑयाची बरी ओल ठायीं ॥1॥ आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साहे असो ॥ध्रु.॥ निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥2॥ तुका ह्मणे नेम न टळतां बरें । ख†यासी चि खरें ऐसें नांव ॥3॥ 3762 आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥1॥ न देखेल लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥ नव्हे सांडी परि वाटतें निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥2॥ तुका ह्मणे तुह्मीं सदैव जी देवा । माझ्या हा चि जीवा एक ठाव ॥3॥ 3763 किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥1॥ रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवी विषय माजिरा ॥ध्रु.॥ कळतां न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥2॥ तुका ह्मणे जन । ऐसें नांवबुिद्धहीन । बहुरंगें भिन्न । एकीं एक निमलें ॥3॥ 3764 मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥1॥ हें भरा सातें आलें । भलें भलें ह्मणवावें ॥ध्रु.॥ जनीं जनादऩन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥2॥ तुका ह्मणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें॥3॥ 3765 नामाचा महिमा बोलिलों उत्कर्ष । अंगा कांहीं रस न ये चि तो ॥1॥ कैसें समाधान राहे पांडुरंगा । न लगे चि अंगा आणी कांहीं ॥ध्रु.॥ लाभाचिये अंगीं सोस कवतुकें । फिक्याचें तें फिकें वेवसाव ॥2॥ तुका ह्मणे करा आपुला महिमा । नका जाऊं धर्मावरि माझ्या ॥3॥ 3766 हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥1॥ करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥ गंगोदकें गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥2॥ जोडोनियां हात । करी तुका प्रणिपात ॥3॥ 3767 अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों ॥1॥ बरवें जालें देशाउर । आल्या दुर सारिखें ॥ध्रु.॥ राहोनियां जातों ठाया । आलियाची निशानी ॥2॥ तुका ह्मणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥3॥ 3768 आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥1॥ पायावरि ठेवूं माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥ध्रु.॥ येथून तेथवरि आतां। नाहीं सत्ता आणिकांची ॥2॥ तुका ह्मणे चक्रपाणी । शिरोमणी बिळयांचा ॥3॥ 3769 बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥1॥ अभयें च जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ध्रु.॥ साधनाचा न लगे पांग । अवघें सांग कीर्तन ॥2॥ तुका ह्मणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥3॥ 3770 मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥1॥ नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकिळक ॥ध्रु.॥ विश्वासावांचून । नांवें दुजियाचे शून्य ॥2॥ देवाविण कांहीं । तुका ह्मणे उरी नाहीं॥3॥ 3771 वैराग्याचा अंगीं जालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥1॥ कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥ नये चि यावया पंढरीचें मूळ । न देवे चि माळ कंठींची ही ॥2॥ तुका ह्मणे जालें अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥3॥ 3772 आिळकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥1॥ सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥ अंतरलों मागें संवसारा हातीं । पायांपें सरतीं जालों नाहीं ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी विचारा जी देवा । ठेवाल तें ठेवा कोणे परी ॥3॥ 3773 स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरि होऊं नये ॥1॥ आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥ बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन कोमळीं चरणांबुजें ॥2॥ तुका ह्मणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनियां ठेवा पडदा आतां ॥3॥ 3774 येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥1॥ आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥ विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडे चि बोल फोस वांझे ॥2॥ तुका ह्मणे आलों निर्वाणा च वरी । राहों नेदीं उरी नारायणा ॥3॥ 3775 ह्मणउनि काय जीऊं भHपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥1॥ आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥ तुके तरि तुकीं ख†याचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरि ॥2॥ तुका ह्मणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करीं देवा ॥3॥ 3776 आपण चि व्हाल साहे । कसियाला हे धांवणी॥1॥ भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ध्रु.॥ आहाच कैंचा बीजा मोड । प्रीति कोड वांचूनि ॥2॥ तुका ह्मणे दंडिन काया । याल तया धांवणिया ॥3॥ 3777 नििश्चतीनें होतों करुनियां सेवा । कां जी मन देवा उद्वेगिलें ॥1॥ अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥ध्रु.॥ कोण तुह्मांविण मनाचा चाळक । दुजें सांगा एक नारायणा ॥2॥ तुका ह्मणे माझा मांडिला विनोद । करऊं नेणें छंद कराल काइ ॥3॥ 3778 आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास ॥1॥ नाहीं चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥ध्रु.॥ स्वामीच्या उत्तरें । सुख वाटे अभयें करें ॥2॥ न मगें परि भातें । तुका ह्मणे निढिळ रितें ॥3॥ 3779 जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित ॥1॥ मज नको लावूं तैसें । वांयां जायें ऐसें पिसें ॥ध्रु.॥ धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥2॥ चतुराच्या राया । अंगीकारावें तुकया॥3॥ 3780 राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥1॥ लव्हाऑयासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ध्रु.॥ कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥2॥ तुका ह्मणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥3॥ 3781 म्हणउनि जाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥1॥ दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥ हातें मुरगािळतां कान। नाहीं भिन्न वेदना ॥2॥ तुका ह्मणे एकांतसुखें । अवघें गोतें गुंतलें॥3॥ 3782 न पडो आतां हाडीं घाव । मध्यें कींव नासक ॥1॥ करविली आत्महत्या । जीवा कां द्वंदाचा ॥ध्रु.॥ आशापाशीं गुंतला गळा । तेणें कळाहीन जालों ॥2॥ तुका ह्मणे लावूं मुळी । जीवकुळी थोरेसी ॥3॥ 3783 सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥1॥ लादी थींके लाजिरवाणी । हीनकमाइऩची घाणी ॥ध्रु.॥ पुष्प जवळी नाका। दुगपधीच्या नांवें थुंका ॥2॥ तुका ह्मणे किती । उपदेशहीन जाती॥3॥ 3784 असाल ते तुह्मी असा । आह्मी सहसा निवडों ना॥1॥ अनुसरलों एका चित्तें । हातोंहातें गींवसित ॥ध्रु.॥ गुणदोष काशासाटीं । तुमचे पोटीं वागवूं ॥2॥ तुका ह्मणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥3॥ 3785 सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥1॥ एकसरीं केलीं किळवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥ संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचें ॥2॥ तुका ह्मणे हें तूं ब्रह्मांड चािळता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥3॥ 3786 आहे तैसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥1॥ वचनाचा भार पडिलिया शिरीं । जालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥ अबोल्याची सवे लावुनियां मना । फाकों नेदीं गुणा ऐसें करूं ॥2॥ तुका ह्मणे आह्मां गोंवऑयाचा संग । राखतें तें अंग जाणतसों ॥3॥ 3787 तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥1॥ कूट खाती मागें पुढें । जाती नरयेगांवा पुढें ॥ध्रु.॥ माझी ह्मणती कवी। निषेधुनि पापी जीवीं ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥3॥ 3788 दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥1॥ गुण ज्याचे जो अंतरीं । तो चि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥ चोरा रुचे निशी। देखोनियां विटे शशी ॥2॥ तुका ह्मणे जन । देवा असे भाग्यहीन ॥3॥ 3789 ह्मणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥1॥ तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥ बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥2॥ तुका ह्मणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट॥3॥ 3790 ऐसीं वर्में आह्मां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥1॥ पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा हालों नेदीं ॥ध्रु.॥ आपुले इच्छेसी घालीन संपुष्टीं । श्रीमुख तें दृष्टी न्याहाळीन ॥2॥ तुका ह्मणे बहु सांडियेलीं मतें । आपुल्या पुरतें धरुनी ठेलों ॥3॥ 3791 रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥1॥ जातिस्वभाव आला डोऑयां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥ कामधेनु देखे जैशा गाइऩह्मैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥2॥ तुका ह्मणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥3॥ 3792 तरी च हीं केलीं । दानें वाइऩट चांगलीं ॥1॥ येक येक शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥ काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चािळता ॥2॥ तुका ह्मणे धुरें । डोळे भरिले परि खरें॥3॥ 3793 अंधळें तें सांगे सांगितल्या खुणा । अनुभव देखणा प्रगट त्या ॥1॥ नांदणुक सांगे वडिलाचें बळ । कैसा तो दुर्बळ सुख पावे ॥2॥ तुका ह्मणे नांदों आपल्या प्रतापें । तयासी लोकांपें स्तुती सांगों ॥3॥ 3794 करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण। तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥1॥ तैसें जालें दोघांजणां। मागतिया यजमाना । जािळयेलें वनां । आपणासहित कांचणी॥ध्रु.॥ घडितां दगडाची नाव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव। बुडवी तारूं तरतीया ॥2॥ चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा । तुका ह्मणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥3॥ 3795 जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥1॥ जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायीं ॥ध्रु.॥ जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचें ॥2॥ जळो हें शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठीं ॥3॥ तुका ह्मणे येथे अवघें चि होय । धरीं मना सोय विठोबाची ॥4॥ 3796 विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥1॥ तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा॥ध्रु.॥ न कळे हें मज साच चाळविलें । देसी तें उगलें घेइन देवा ॥2॥ मागणें तें सरे ऐसें करीं देवा । नाहीं तरी सेवा सांगा पुढें॥3॥ करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका ह्मणे बोलें पांडुरंगा॥4॥ 3797 देवाचिये पायीं देइप मना बुडी । नको धांवों वोढी इंिद्रयांचे ॥1॥ सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥ जाणें येणें खुंटे धांवे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥2॥ सांगन तें तुज इतुलें चि आतां । मानी धन कांता विषतुल्य ॥3॥ तुका ह्मणे तुझे होती उपकार । उतरों हा पार भवसिंधु ॥4॥ 3798 आह्मी विठ्ठलाचे दास जालों आतां । न चले हे सत्ता आणिकांची ॥1॥ नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥ कोठें तुज ठाव घ्यावयासी धांवा । मना तूं विसावा घेइऩ आतां ॥2॥ इंिद्रयांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगें संचार चाळी तुज ॥3॥ तुका ह्मणे आह्मी जिंकोनियां काळ । बैसलों निश्चळ होऊनियां ॥4॥ 3799 सांगतों तरि तुह्मी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥1॥ करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥2॥ कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका ह्मणे आण विठ्ठलाची ॥3॥ 3800 शब्दYाानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभH ते ॥1॥ जळो ते जाणींव जळो त्याचे दंभ । जळो त्याचें तोंड दुर्जनाचें ॥2॥ तुका ह्मणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥3॥ 3801 अन्यायासी राजा जरि न करितां दंड । बहुचक ते लंड पीडिती जना ॥1॥ ने करी निगा कुणबी न काढितां तण । कैंचे येती कण हातासी ते ॥2॥ तुका ह्मणे संतां करूं नये अनुचित। पाप नाहीं नीत विचारिता ॥3॥ 3802 भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुस†याची ॥1॥ असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥ समर्थासी काय कोणें हें ह्मणावें । आपुलिया जावें भोगावरि ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥3॥ 3803 मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥1॥ आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कवण कवणासी बोलों नका ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां सांगतों मी खुण । देवासी तें ध्यान लावुनि बसा ॥3॥ 3804 आषाढी निकट । आणी कातिऩकीचा हाट ॥1॥ पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु.॥ तें चि घ्यावें तें चि घ्यावें । कैवल्याच्या रासी भावें ॥2॥ कांहीं कोणा नेणे । विठो वांचूनि तुका ह्मणे ॥3॥ 3805 देऊनियां प्रेम मागितलें चित्त । जाली फिटाफिट तुह्मां आह्मां ॥1॥ काशानें उदार तुह्मांसी ह्मणावें । एक नेसी भावें एक देसी ॥ध्रु.॥ देऊनियां थोडें नेसील हें फार । कुंटिसी विचार अवघियांचा ॥2॥ तुका ह्मणे आह्मां भांडवल चित्त । देउनी दुिश्चत पाडियेलें ॥3॥ 3806 तातडीची धांव अंगा आणि भाव । खोळंबा तो मग निश्चयाचा ॥1॥ ह्मणउनि बरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥ कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥2॥ तुका ह्मणे बरी झ†याची ते चाली । सांचवण्या खोली कैसीयांची ॥3॥ 3807 मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळीं सदा ॥1॥ देवा कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥ न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसें ॥2॥ मृत्युलोकीं कोण धरिलें वासना । पावावया जनासवें दुःख ॥3॥ तुका ह्मणे तुझा दास ऐसें लोकां । कांहीं सकिळकां कळों यावें ॥4॥ 3808 घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । जाली वेरझार हाणी ॥1॥ घाला घातला वैकुंठीं । करूनियां जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ध्रु.॥ अवघें आणिलें अंबर । विठोसहित तेथें धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणीं धरियेला ॥2॥ संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघीं जालीं गहन । केलीं पापपुण्यें । देशधडी बापुडीं ॥3॥ आनंदें गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कांपती असुर । वीर कवणा नांगवती॥4॥ जें दुर्लभ ब्रह्मादिकां । आजि सांपडलें फुका । घ्या रे ह्मणे तुका । सावचित्त होउनी ॥5॥ 3809 तुझिया दासांचा हीन जालों दास । न धरीं उदास मायबापा ॥1॥ तुजविण प्राण कैसा राहों पाहे । वियोग न साहे क्षणभरि ॥ध्रु.॥ आणिक माझ्या जीवें मोकलिली आस । पाहे तुझी वास पांडुरंगा ॥2॥ सर्वभावें तुज आणिला उचित । राहिलों नििंश्चत तुझे पायीं ॥3॥ तुका ह्मणे तुज असो माझा भार । बोलतों मी फार काय जाणें ॥4॥ 3810 ते चि करीं मात । जेणें होइल तुझें हित ॥1॥ काय बडबड अमित । सुख जिव्हारीं सिणविसी ॥ध्रु.॥ जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हांसे खरजुला ॥2॥ आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी ॥3॥ क्षयरोगी ह्मणे परता । सर रोगिया तूं आतां ॥4॥ वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोंचें ह्मणे ॥5॥ तुका ह्मणे लागों पायां । शुद्ध करा आपणियां ॥6॥ 3811 कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आठविलें ॥1॥ जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे सेवटीं हातीं कांहीं ॥2॥ तुका ह्मणे माझे गेले दोन्ही ठाय । सवसार ना पाय तुझे मज ॥3॥ 3812 आतां तरी मज सांगा साच भाव । काय म्यां करावें ऐसें देवा ॥1॥ चुकावया कर्म नव्हतें कारण । केला होय सीण अवघा चि ॥2॥ तुका ह्मणे नको पाहूं निरवाण । देइप कृपादान याचकासी ॥3॥ 3813 बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आह्मी अविश्वासी सर्वभावें ॥1॥ दंभें करी भHी सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगिळया ॥2॥ तुका ह्मणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥3॥ 3814 नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥1॥ शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळ ही हेम ॥ध्रु.॥ प्रजन्य वर्षतां जीवना वाहावट । तें समसकट गंगे मिळे ॥2॥ सर्व तें हें जाय गंगा चि होऊन । तैसा वर्णावर्ण नाहीं नामीं ॥3॥ महांपुरीं जैसें जातसे उदक । मध्यें तें तारक नाव जैसी ॥4॥ तये नावेसंगें ब्राह्मण तरती । केवीं ते बुडती अनामिक॥5॥ नाना काष्ठजात पडतां हुताशनीं । ते जात होउनी एकरूप ॥6॥ तेथें निवडेना घुरे कीं चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥7॥ पूर्वानुवोळख तें चि पैं मरण । जरि पावे जीवन नामामृत ॥8॥ नामामृतें जालें मुळीचें स्मरण । सहज साधन तुका ह्मणे ॥9॥ 3915 काय वांचोनियां जालों भूमिभार । तुझ्या पायीं थार नाहीं तरि ॥1॥ जातां भलें काय डोिळयांचें काम । जरि पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥ काय मुख बिळ श्वापदाचे धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥2॥ तुका ह्मणे पैं या पांडुरंगाविण । न वचे चि क्षण जीव भला ॥3॥ 3816 सोइ†यासी करी पाहुणेर बरा । कांडितो ठोंबरा संता साटीं ॥1॥ गाइऩसी देखोनी बदबदा मारी । घोडएाची चाकरी गोड वाटे ॥ध्रु.॥ पान फुल नेतो वेश्येसी उदंड । ब्राह्मणासी खांड देऊं नेदी ॥2॥ पर्वकाळीं धर्म न करी नासरी । वेची राजद्वारीं उदंड चि॥3॥ कीर्त्तना जावया होतसे हींपुष्टी । खेळतो सोंकटीं रात्रंदिवस॥4॥ बाइलेच्या गोता आवडीनें पोसी । मातापितियासाी दवडितो ॥5॥ तुका ह्मणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥6॥ 3817 कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें ॥1॥ तुझा ह्मणऊनि आणिकापें उभा । राहों हें तों शोभा नेदी आतां ॥ध्रु.॥ काळें पुरविली पाठी दुरवरी । पुढें पायां धीरी राहों नेदी ॥2॥ नको आणूं माझें संचित मनासी । पावन आहेसी पतितां तूं ॥3॥ तुका ह्मणे चाले आणिकांची सत्ता । तुज आळवितां नवल हें ॥4॥ 3818 कावऑयाच्या गळां मुHाफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥1॥ गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥ बकापुढें सांगे भावार्थे वचन । वाउगा चि सीण होय त्यासी ॥2॥ तुका ह्मणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां सीण करूं नये ॥3॥ 3819 आतां धरितों पदरीं । तुज मज करीन सरी ॥1॥ जालों जीवासी उदार । उभा ठाकलों समोर ॥2॥ तुका विनवीतसे संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा ॥3॥ 3820 न कळसी Yााना न कळसी ध्याना । न कळेसी दर्शना धुंडािळतां ॥1॥ न कळेसी आगमा न कळेसी निगमा । न बोलवे सीमा वेदां पार ॥2॥ तुका ह्मणे तुझा नाहीं अंतपार । ह्मणोनि विचार पडिला मज ॥3॥ 3821 पायां लावुनियां दोरी । भृंग बांधिला लेंकुरीं ॥1॥ तैसा पावसी बंधन । मग सोडवील कोण ॥ध्रु.॥ गळां बांधोनियां दोरी । वांनर हिंडवी घरोघरीं ॥2॥ तुका ह्मणे पाहें । रीस धांपा देत आहे ॥3॥ 3822 मायबापें सांभािळती । लोभाकारणें पािळती ॥1॥ तैसा नव्हे देवराव । याचा कृपाळु स्वभाव ॥ध्रु.॥ मनासारिखें न होतां । बाळकासी मारी माता ॥2॥ तुका ह्मणे सांगूं किती । बाप लेंकासी मारिती ॥3॥ 3823 धन मेळवूनि कोटी । सवें नये रे लंगोटी ॥1॥ पानें खाशील उदंड । अंतीं जासी सुकल्या तोंडें ॥ध्रु.॥ पलंग न्याहाल्या सुपती । शेवटीं गोव†या सांगाती ॥2॥ तुका ह्मणे राम । एक विसरतां श्रम ॥3॥ 3824 विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥1॥ तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥ माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥2॥ लोभ मोह माया आह्मां बांधवितां । तरि हा अनंता बोल कोणा ॥3॥ तुका ह्मणे मी तों पतित चि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥4॥ 3825 त्राहे त्राहे सोडवीं अनंता । लागों दे ममता तुझे पायीं॥1॥ एक चि मागणें देइप तुझी गोडी । न लगे आवडी आणिकाची ॥ध्रु.॥ तुझें नाम गुण वर्णीन पवाडे । आवडीच्या कोडें नाचों रंगीं ॥2॥ बापा विठ्ठलराया हें चि देइप दान । जोडती चरण जेणें तुझे ॥3॥ आवडीसारखें मागितलें जरी । तुका ह्मणे करीं समाधान ॥4॥ 3826 सुगरणीबाइऩ थिता नास केला । गुळ तो घातला [[भाजी]]मध्यें ॥1॥ क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ कैसें केलें ॥ध्रु.॥ दळण दळोनी भरूं गेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥2॥ कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥3॥ रत्नाचा जोहारी रत्न चि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥4॥ तुका ह्मणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥5॥ 3827 बाप माझा दिनानाथ । वाट भHांची पाहात ॥1॥ कर ठेवुनियां करीं । उभा चंद्रभागे तिरीं ॥ध्रु.॥ गळां वैजयंतीमाळा। रूपें डोळस सांवळा ॥2॥ तुका ह्मणे भेटावया । सदा उभारिल्या बाहएा ॥3॥ 3828 माझें जीवन तुझे पाय । कृपाळुं तूं माझी माय ॥1॥ नेदीं दिसों किविलवाणें । पांडुरंगा तुझें तान्हें ॥ध्रु.॥ जन्ममरण तुजसाटीं । आणीक नेणें दुजी गोष्टी ॥2॥ तुका ह्मणे तुजविण । कोण हरिल माझा सीण ॥3॥ 3829 कां रे पुंडएा मातलासी । उभें केलें विठ्ठलासी ॥1॥ ऐसा कैसा रे तूं धीट । मागें भिरकाविली वीट ॥ध्रु.॥ युगें जालीं अठ्ठावीस । अजुनी न ह्मणसी बैस ॥2॥ भाव देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥3॥ तुका ह्मणे पुंडलिका । तूं चि बिळया एक निका ॥4॥ 3830 तुज पाहातां समोरी । दृिष्ट न फिरे माघारी ॥1॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥ध्रु.॥ नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥2॥ तुका ह्मणे बळी । जीव दिला पायांतळीं ॥3॥ 3831 उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥1॥ शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥ नाहीं भाव मनीं नाइके वचन । आपला आपण उणें घेतों ॥2॥ तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करी बडबड रिती दिसे ॥3॥ 3832 समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥1॥ न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥ मान भलेपण नाहीं फुकासाटीं । जयावरि गांठी झीज साहे ॥2॥ तुका ह्मणे हें तूं सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥3॥ 3833 आनंदें कीर्तन कथा करीं घोष । आवडीचा रस प्रेमसुख ॥1॥ मज या आवडे वैष्णवांचा संग । तेथें नाहीं लाग किळकाळा ॥ध्रु.॥ स्वल्प मात्र वाचे बैसलासे निका । राम कृष्ण सखा नारायण ॥2॥ विचारितां मज दुजें वाटे लाज । उपदेशें काज आणीक नाहीं ॥3॥ तुका ह्मणे चित्त रंगलेंसे ठायीं । माझें तुझ्या पायीं पांडुरंगा ॥4॥ 3834 ब्रह्मYाान जेथें आहे घरोघरीं । सर्व निरंतरी चतुर्भुज॥1॥ पापा नाहीं रीग काळाचें खंडण । हरिनामकीर्तन परोपरी ॥2॥ तुका ह्मणे हा चि भाव माझ्या चित्तीं । नाहीं आणिकां गती चाड मज॥3॥ 3835 मज नाहीं कोठें उरला दुर्जन । मायबापाविण ब्रह्मांडीं हें ॥1॥ कासया जिकीर करणें येविसीं । भयाची मानसीं चिंता खंती ॥ध्रु.॥ विश्वंभराचिये लागलों सांभाळीं । संत नेती चाली आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे माझें पाळणें पोषणें । करी नारायण सर्वस्वेंसी ॥3॥ 3836 नाहीं हित ठावें जननीजनका । दाविले लौकिकाचार तींहीं ॥1॥ अंधऑयाचे काठी अंधळें लागलें । घात एकवेळे मागेंपुढें ॥ध्रु.॥ न ठेवावी चाली करावा विचार । वरील आहार गळी लावी ॥2॥ तुका ह्मणे केला निवाडा रोकडा । राऊत हा घोडा हातोहातीं ॥3॥ 3837 आतां पहाशील काय माझा अंत । आलों शरणागत तुज देवा ॥1॥ करीं अंगीकार राखें पायांपाशीं । झणीं दिसों देसी कऴिवलवाणें ॥ध्रु.॥ नाहीं आइकिली मागें ऐसी मात । जे त्वां शरणागत उपेिक्षले ॥2॥ तुका ह्मणे आतां धरीं अभिमान । आहेसी तूं दानशूर दाता ॥3॥ 3838 होइऩल तो भोग भोगीन आपुला । न घलीं विठ्ठला भार तुज ॥1॥ तुह्मांपासाव हें इच्छीतसें दान । अंतरींचें ध्यान मुखीं नाम ॥ध्रु.॥ नये काकुलती गर्भवासांसाटीं । न धरीं हें पोटीं भय कांहीं ॥2॥ तुका ह्मणे मज उदंड एवढें । न वांचावें पुढें मायबापा॥3॥ 3839 काय तुझी ऐसी वेचते गांठोळी । मांहे टाळाटाळी करीतसां ॥1॥ चतुराच्या राया आहो पांडुरंगा । ऐसें तरि सांगा निवडूनि ॥ध्रु.॥ कोण तुह्मां सुख असे या कवतुकें । भोगितां अनेकें दुःखें आह्मी ॥2॥ तुका ह्मणे काय जालासी निर्गुण । आह्मां येथें कोण सोडवील ॥3॥ 3840 देवाची पूजा हे भूताचें पाळण । मत्सर तो सीण बहुतांचा ॥1॥ रुसावें फुगावें आपुलियावरि । उरला तो हरि सकळ ही ॥2॥ तुका ह्मणे संतपण यां चि नांवें । जरि होय जीव सकळांचा ॥3॥ 3841 नाहीं जप तप जीवाची आटणी । मनासी दाटणी नाहीं केली ॥1॥ निजलिया ठायीं पोकारिला धांवा । सांकडें तें देवा तुझें मज ॥ध्रु.॥ नाहीं आणूनियां समपिऩलें जळ । सेवा ते केवळ चिंतनाची ॥2॥ तुका ह्मणे आह्मीं वेचिलीं उत्तरें । घेतलीं उदारें साच भावें ॥3॥ 3842 देह तंव आहे प्रारब्धा अधीन । याचा मी कां सीण वाहूं भार ॥1॥ सरो माझा काळ तुझिया चिंतनें । कायावाचामनें इच्छीतसें ॥ध्रु.॥ लाभ तो न दिसे याहूनि दुसरा । आणीक दातारा येणें जन्में ॥2॥ तुका ह्मणे आलों सोसीत संकटें । मी माझें वोखटें आहे देवा ॥3॥ 3843 सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥1॥ जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥ मन िस्थर माझें जालेंसे निश्चळ । वारिलीं सकळ आशापाश ॥2॥ जन्मजराव्याधि निवारिलें दुःख । वोसंडलें सुख प्रेम धरी ॥3॥ तुका ह्मणे मज जाला हा निर्धार । आतां वांयां फार काय बोलों ॥4॥ 3844 होऊं शब्दस्पर्श नये माझा तुह्मां । विप्रवृंदा तुह्मां ब्राह्मणांसी॥1॥ ह्मणोनियां तुह्मां करितों विनंती । द्यावें शेष हातीं उरलें तें ॥ध्रु.॥ वेदीं कर्म जैसें बोलिलें विहित । करावी ते नीत विचारूनि ॥2॥ तुमचा स्वधर्म माझा अधिकार । भोजन उत्तर तुका ह्मणे ॥3॥ 3845 बहुत असती मागें सुखी केलीं । अनाथा माउली जिवांची तूं ॥1॥ माझिया संकटा न धरीं अळस । लावुनियां कास पार पावीं ॥ध्रु.॥ कृपावंता करा ज्याचा अंगीकार । तया संवसार नाहीं पुन्हां ॥ ।2॥ विचारितां नाहीं दुजा बिळवंत । ऐसा सर्वगत व्यापी कोणी ॥3॥ ह्मणउनि दिला मुळीं जीवभाव । देह केला वाव समाधिस्थ ॥4॥ तुका ह्मणे नाहीं जाणत आणीक । तुजविण एक पांडुरंगा ॥5॥ 3846 वैभवाचे धनी सकळ शरणागत । सत्यभावें चित्त अपिऩलें तें ॥1॥ नेदी उरों देव आपणांवेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥ जाणोनि नेणती अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणे चि ॥2॥ तुका ह्मणे बरे धाकटएाचें जिणें । माता स्तनपानें वाढविते ॥3॥ 3847 आह्मां देणें धरा सांगतों तें कानीं । चिंता पाय मनीं विठोबाचे ॥1॥ तेणें माझें चित्त होय समाधान । विलास मिष्टान्न न लगे सोनें ॥ध्रु.॥ व्रत एकादशी दारीं वृंदावन । कंठीं ल्या रे लेणें तुळसीमाळा ॥2॥ तुका ह्मणे त्याचे घरींची उष्टावळी । मज ते दिवाळी दसरा सण ॥3॥ 3848 आतां मी अनन्य येथें अधिकारी । होइन कोणे परी नेणें देवा ॥1॥ पुराणींचा अर्थ ऐकतां मानस । होतो कासावीस जीव माझा ॥ध्रु.॥ इंिद्रयांचे आह्मी पांगिलों अंकित । त्यांच्यासंगें चित्त रंगलें तें ॥2॥ एकाचें ही जेथें न घडे दमन । अवघीं नेमून कैसीं राखों ॥3॥ तुका ह्मणे जरी मोकिळसी आतां । तरी मी अनंता वांयां गेलों ॥4॥ 3849 आवडी धरोनी आलेती आकारा । केला हा पसारा याजसाटीं ॥1॥ तें मी तुझें नाम गाइऩन आवडी । क्षण एक घडी विसंबेना ॥ध्रु.॥ वर्म धरावें हा मुख्यधर्मसार । अवघे प्रकार तयापासीं॥2॥ वेगऑया विचारें वेगळाले भाव । धरायासी ठाव बहु नाहीं ॥3॥ तुका ह्मणे घालूं इच्छेचिये पोटीं । कवळुनी धाकुटी मूर्ती जीवें ॥4॥ 3850 भागलों मी आतां आपुल्या स्वभावें । कृपा करोनि देवें आश्वासीजे ॥1॥ देउनि आलिंगन प्रीतीच्या पडिभरें । अंगें हीं दातारें निववावीं ॥ध्रु.॥ अमृताची दृष्टी घालूनियां वरी । शीतळ हा करीं जीव माझा ॥2॥ घेइप उचलूनि पुसें तानभूक । पुसीं माझें मुख पीतांबरें ॥3॥ बुझावोनि माझी धरीं हनुवंटी । ओवाळुनि दिठी करुनी सांडीं ॥4॥ तुका ह्मणे बापा आहो विश्वंभरा । आतां कृपा करा ऐसी कांहीं ॥5॥ 3851 न सरे लुटितां मागें बहुतां जनीं । जुनाट हे खाणी उघडिली ॥1॥ सिद्ध महामुनि साधक संपन्न । तिहीं हें जतन केलें होतें ॥ध्रु.॥ पायाळाच्या गुणें पडिलें ठाउकें । जगा पुंडलिकें दाखविलें ॥2॥ तुका ह्मणे येथें होतों मी दुबळें । आलें या कपाळें थोडें बहु ॥3॥ 3852 भगवें तरी श्वान सहज वेष त्याचा । तेथें अनुभवाचा काय पंथ ॥1॥ वाढवुनी चटा फिरे दाही दिशा । तरी जंबुवेषा सहज िस्थति ॥ध्रु.॥ कोरोनियां भूमी करिती मधीं वास । तरी उंदरास काय वाणी ॥2॥ तुका ह्मणे ऐसें कासया करावें । देहासी दंडावें वाउगें चि ॥3॥ 3853 धन्य दिवस आजि डोिळयां लाधला । आनंद देखिला धणीवरी ॥1॥ धन्य जालें मुख निवाली रसना । नाम नारायणा घोंष करूं ॥ध्रु.॥ धन्य हें मस्तक सर्वांग शोभलें । संताचीं पाउलें लागताती ॥2॥ धन्य आजि पंथें चालती पाउलें । टािळया शोभले धन्य कर ॥3॥ धन्य तुका ह्मणे आह्मांसी फावलें । पावलों पाउलें विठोबाचीं ॥4॥ 3854 बरवी हे वेळ सांपडली संधि । साहए जाली बुिद्ध संचितासी ॥1॥ येणें पंथें माझीं चालिलीं पाउलें । दरुषण जालें संतां पायीं ॥ध्रु.॥ त्रासिलें दरिद्रें दोषा जाला खंड । त्या चि काळें पिंड पुनीत जाला ॥2॥ तुका ह्मणे जाला अवघा व्यापार । आली वेरझार फळासी हे ॥3॥ 3855 आपणा लागे काम वाण्याघरीं गुळ । त्याचे याति कुळ काय कीजे ॥1॥ उकरडएावरी वाढली तुळसी । टाकावी ते कैसी ठायागुणें ॥ध्रु.॥ गाइऩचा जो भक्ष अमंगळ खाय । तीचें दूध काय सेवूं नये ॥2॥ तुका ह्मणे काय सलपटासी काज । फणसांतील बीज काढुनि घ्यावें ॥3॥ 3856 जयासी नावडे वैष्णवांचा संग । जाणावा तो मांग जन्मांतरीं ॥1॥ अपवित्र वाचा जातीचा अधम । आचरण धर्म नाहीं जया ॥ध्रु.॥ मंजुळवदनीं बचनागाची कांडी । शेवटीं विघडी जीवप्राणा॥2॥ तुका ह्मणे ज्याचा पिता नाहीं शुद्ध । तयासी गोविंद अंतरला ॥3॥ 3857 वांझेनें दाविलें ग†हवार लक्षणें । चिरगुटें घालून वाथयाला ॥1॥ तेवीं शब्दYाानी करिती चावटी । Yाान पोटासाटीं विकूनियां ॥ध्रु.॥ बोलाचि च [[कढी]] बोलाचा चि भात । जेवुनियां तृप्त कोण जाला ॥2॥ कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥3॥ तुका ह्मणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं आठवण ॥4॥ 3858 तुझिया पाळणा ओढे माझें मन । गेलों विसरोन देहभाव ॥1॥ लागला पालट फेडणें उसणें । येणें चि प्रमाणें पांडुरंगा ॥2॥ तुका ह्मणे माझा जीव जैसा ओढे । तैसा चि तिकडे पाहिजेल ॥3॥ 3859 मी दास तयांचा जयां चाड नाहीं । सुखदुःख दोहीं विरहित ॥1॥ राहिलासे उभा भीवरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥ नवल काय तरी पाचारितां पावे । न स्मरत धांवे भHकाजा ॥2॥ सर्व भार माझा त्यासी आहे चिंता । तो चि माझा दाता स्वहिताचा ॥3॥ तुका ह्मणे त्यासी गाइऩन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥4॥ 3860 जुंझायाच्या गोष्टी ऐकतां चि सुख । करितां हें दुःख थोर आहे ॥1॥ तैसी हरिभिH सुळावरील [[पोळी]] । निवडे तो बळी विरळा शूर ॥ध्रु.॥ पिंड पोसिलियां विषयांचा पाइक । वैकुंठनायक कैंचा तेथें ॥2॥ तुका ह्मणे व्हावें देहासी उदार । रकुमादेवीवर जोडावया ॥3॥ 3861 पाषाण प्रतिमा सोन्याच्या पादुका । हें हो हातीं एका समर्थाचे ॥1॥ अनामिका हातीं समर्थाचा सिक्का । न मानितां लोकां येइल कळों ॥2॥ तुका ह्मणे येथें दुराग्रह खोटा । आपुल्या अदृष्टा शरण जावें ॥3॥ 3862 बहु या प्रपंचें भोगविल्या खाणी । टाकोनियां मनीं ठेविला सीण ॥1॥ आतां पायांपाशीं लपवावें देवा । नको पाहूं सेवा भHी माझी ॥ध्रु.॥ बहु भय वाटे एकाच्या बोभाटें । आली घायवटे फिरोनियां ॥2॥ तुका ह्मणे सिगे भरूं आलें माप । वियोग संताप जाला तुझा ॥3॥ 3863 धरूनियां मनीं बोलिलों संकल्प । होसी तरि बाप सिद्धी पाव ॥1॥ उत्कंठा हे आजी जाली माझे पोटीं । मोकिळली गोष्टी टाळाटाळ ॥ध्रु.॥ माझा मज असे ठाउका निर्धार । उपाधि उत्तर न साहे पैं ॥2॥ तुका ह्मणे जरि दिली आठवण । तरि अभिमान धरीं याचा ॥3॥ 3864 आजिवरी होतों संसाराचे हातीं । आतां ऐसें चित्तीं उपजलें ॥1॥ तुला शरणागत व्हावें नारायणा । अंगीकारा दिना आपुलिया ॥ध्रु.॥ विसरलों काम याजसाठीं धंदा । सकळ गोविंदा माझें तुझें ॥2॥ तुका ह्मणे विYाापना परिसावी । आवडी हे जीवीं जाली तैसी ॥3॥ 3865 धन्यधन्य ज्यास पंढरीसी वास । धन्य ते जन्मास प्राणी आले ॥1॥ बहु खाणीमध्यें होत कोणी एक । त्रिगुण कीटक पिक्षराज ॥ध्रु.॥ उत्तम चांडाळ नर नारी बाळ । अवघे चि सकळ चतुर्भुज ॥2॥ अवघा विठ्ठल तेथें दुजा नाहीं । भरला अंतर्बाहि सदोदीत ॥3॥ तुका ह्मणे येथें होउनी राहेन । सांडोवा पाषाण पंढरीचा ॥4॥ 3866 असंत लक्षण भूतांचा मत्सर । मनास निष्ठ‍ अतिवादी॥1॥ अंतरीचा रंग उमटे बाहेरी । वोळखियापरी आपेंआप॥ध्रु.॥ संत ते समय वोळखती वेळ । चतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥2॥ तुका ह्मणे हित उचित अनुचित । मज लागे नित आचरावें ॥3॥ 3867 विठ्ठलावांचोनि ब्रह्म जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥1॥ विठ्ठलावांचूनि जेजे उपासना । अवघा चि जाणा संभ्रमु तो ॥ध्रु.॥ विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होत जाणा ॥2॥ विठ्ठलांवाचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पित्त वाउगीया ॥3॥ तुका ह्मणे एक विठ्ठल चि खरा । येर तो पसारा वाउगा चि ॥4॥ 3868 सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड मध्यें ॥1॥ धाड पडो तुझ्या थोरपणावरि । वाचे नरहरि उच्चारीना ॥ध्रु.॥ जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥2॥ सकळां चरणीं गिळत माझा जीव । तुका ह्मणे भाव एकविध ॥3॥ 3869 मधुरा उत्तरासवें नाहीं चाड । अंतरंगीं वाड भाव असो ॥1॥ प्राणावेगळा न करी नारायण । मग नसो Yाान मूर्ख बरा॥ध्रु.॥ जननिंदा होय तो बरा विचार । थोरवीचा भार कामा नये॥2॥ तुका ह्मणे चित्तीं भाव निष्टावंत । दया क्षमा शांत सर्वां भूतीं ॥3॥ 3870 झाडा वरपोनि खाऊनियां पाला । आठवी विठ्ठला वेळोवेळां ॥1॥ वल्कलें नेसुनि ठुंगा गुंडाळुनी । सांडी देहभान जवळुनी ॥ध्रु.॥ लोकमान वमनासमान मानणें । एकांतीं राहणें विठोसाटीं ॥2॥ सहसा करूं नये प्रपंचीं सौजन्य । सेवावें अरण्य एकांतवास ॥3॥ ऐसा हा निर्धार करी जो मनाचा । तुका ह्मणे त्याचा पांग फिटे ॥4॥ 3871 भिHभावें करी बैसोनि नििश्चत । नको गोवूं चित्त प्रपंचासी ॥1॥ एका दृढ करीं पंढरीचा राव । मग तुज उपाव पुढिल सुचे ॥ध्रु.॥ नको करूं कांहीं देवतापूजन । जप तप ध्यान तें ही नको ॥2॥ मानिसील झणी आपलिक कांहीं । येरझार पाहीं न चुके कदा ॥3॥ ऐसे जन्म किती पावलासी देहीं । अझूनि का नाहीं कळली सोय ॥4॥ सोय घरीं आतां होय पां सावध । अनुभव आनंद आहे कैसा ॥5॥ सहज कैसें आहे तेथीचें तें गुज । अनुभवें निज पाहे तुकीं ॥6॥ तुका ह्मणे आतां होइऩ तूं सावध । तोडीं भवबंध एका जन्में ॥7॥ 3872 दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाटीं केला अपघात ॥1॥ अष्टोत्तरदशें व्याधि ज्य वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥ नव मास माया वाइलें उदरीं । ते माता चौबारीं नग्न केली ॥2॥ गायत्रीचें क्षीर पिळुनी घेऊनी । उपवासी बांधोनी ताडन करी ॥3॥ तुका ह्मणे दासां निंदी त्याचें तोंड । पहातां नरककुंड पूर्वजांसी ॥4॥ 3873 न कळे ब्रह्मYाान आचार विचार । लटिका वेव्हार करीतसे ॥1॥ विश्वामित्री पोटीं तयाचा अवतार । नांव महाखर चांडाळाचें ॥ध्रु.॥ द्रव्यइच्छेसाटीं करीतसे कथा । काय त्या पापिष्ठा न मिळे खाया ॥2॥ पोट पोसावया तोंडें बडबडी । नाहीं धडफुडी एक गोष्टी ॥3॥ तुका ह्मणे तया काय व्याली रांड । येउनिया भंड जनामध्यें ॥4॥ 3874 नित्य उठोनियां खायाची चिंता । आपुल्या तूं हिता नाठवीसी ॥1॥ जननीचे पोटीं उपजलासी जेव्हां । चिंता तुझी तेव्हां केली तेणें ॥ध्रु.॥ चातकां लागूनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवीं ॥2॥ पक्षी वनचरें आहेत भूमीवरि । तयांलागीं हरि उपेक्षीना ॥3॥ तुका ह्मणे भाव धरुन राहें चित्तीं । तरि तो श्रीपति उपेक्षीना ॥4॥ 3875 जेजे आळी केली तेते गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥1॥ काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पािळयेले ॥ध्रु.॥ अभ्यास तो नाहीं स्वप्नीं ही दुिश्चता । प्रत्यक्ष कैंचा चि तो ॥2॥ आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भH ऐसें जगामाजी जालें ॥3॥ तुका ह्मणे आतां नाहीं भरवसा । मोकलिसी ऐसा वाटतोसी ॥4॥ 3876 पूवाअहूनि बहु भH सांभािळले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥1॥ जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥ मिरवे चरणीं ऐसीये गोष्टीचें । भHसांभाळाचें ब्रीद ऐसें ॥2॥ तुका ह्मणे आह्मांसाटी येणें रूपा । माझ्या मायबापा पांडुरंगा ॥3॥ 3877 ददुऩराचें पिलुं ह्मणे रामराम । नाहीं उदक उष्ण होऊं दिलें ॥1॥ कढेमाजी बाळ करी तळमळ । गोविंद गोपाळ पावें वेगीं ॥ध्रु.॥ आYाा तये काळीं केली पावकासी । झणी पिलीयासी तापवीसी ॥2॥ तुका ह्मणे तुझे ऐसे हे पवाडे । वणिऩतां निवाडे सुख वाटे ॥3॥ 3878 करुणा बहुत तुझिया अंतरा । मज विश्वंभरा कळों आलें ॥1॥ पक्षीयासी तुझें नाम जें ठेविलें । तयें उद्धरिलें गणिकेसी॥ध्रु.॥ कुंटिणी ते दोष बहु आचरली । नाम घेतां आली करुणा तुज ॥2॥ हृदय कोमळ तुझें नारायणा । ऐसें बहुता जनां तारियेलें ॥3॥ तुका ह्मणे सीमा नाहीं तुझे दये । कोमळ हृदय पांडुरंगा ॥4॥ 3879 आजामेळा अंत मरणासी आला । तोंवरि स्मरला नाहीं तुज ॥1॥ प्राण जातेवेळे ह्मणे नारायण । त्यासाटीं विमान पाठविलें ॥ध्रु.॥ बहुत कृपाळु होसी जगन्नाथा । त्रैलोक्यसमर्था सोइरिया ॥2॥ तुका ह्मणे भHकाज तूं कैवारी । तुज साही चारी वणिऩताती ॥3॥ 3880 धर्म रक्षावया अवतार घेशी । आपुल्या पािळसी भHजना ॥1॥ अंबॠषीसाटीं जन्म सोसियेलें । दुष्ट निदाऩिळले किती एक ॥ध्रु.॥ धन्य तुज कृपासिंधु ह्मणतील । आपुला तूं बोल साच करीं ॥2॥ तुका ह्मणे तुज वणिऩती पुराणें । होय नारायणें दयासिंधु ॥3॥ 3881 येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥1॥ आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरि भार जीवें भावें ॥ध्रु.॥ निष्ठ‍ अथवा होइप तूं कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥2॥ आपुलें वचन राहावें सांभाळून । तुह्मां आह्मां जाण पडिपाडु ॥3॥ ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होइऩल तयाकडे ॥4॥ तुह्मां आह्मां तैसें नाहीं ह्मणे तुका । होशील तूं सखा जीवलगा ॥5॥ 3882 आइक नारायणा वचन माझें खरें । सांगतों निर्धारें तुजपासीं ॥1॥ नाहीं भाव मज पडिली लोककाज । राहिलेंसे काज तुझे पायीं ॥2॥ जरि तुज कांहीं करणें उचित । तारीं तूं पतित तुका ह्मणे ॥3॥ 3883 अनाथ परदेशी हीन दीन भोळें । उगलें चि लोळे तुझे रंगीं ॥1॥ आपुलें ह्मणावें मज नुपेक्षावें । प्रेमसुख द्यावें मायबापा ॥ध्रु.॥ कासवीचे परि दृष्टी पाहें मज । विYाानीं उमज दावुनियां ॥2॥ तुका ह्मणे तुझा जालों शरणागत । काया वाचा चित्त दुजें नाहीं ॥3॥ 3884 पावलों पंढरी वैकुंठभवन । धन्य आजि दिन सोनियाचा॥1॥ पावलों पंढरी आनंदगजरें । वाजतील तुरें शंख भेरी ॥ध्रु.॥ पावलों पंढरी क्षेमआलिंगनीं । संत या सज्जनीं निवविलें॥2॥ पावलों पंढरी पार नाहीं सुखा । भेटला हा सखा मायबाप ॥3॥ पावलों पंढरी येरझार खुंटली । माउली वोळली प्रेमपान्हा ॥4॥ पावलों पंढरी आपुलें माहेर । नाहीं संवसार तुका ह्मणे ॥5॥ 3885 अभयदान मज देइप गा उदारा । कृपेच्या सागरा पांडुरंगा ॥1॥ देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांही नेणें दुजें ॥ध्रु.॥ सेवा भिH भाव नेणें मी पतित । आतां माझें हित तुझ्या पायीं ॥2॥ अवघा निरोपिला तुज देहभाव । आतां मज पाव पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे तुजें नाम दिनानाथ । तें मज उचित करीं आतां ॥4॥ 3886 लागो तुझी सोय ऐसे कोणी करी । माझे विठाबाइऩ जननिये ॥1॥ पतितपावन ह्मणविसी जरी । आवरण करीं तरी माझें ॥ध्रु.॥ नाहीं तरी ब्रीद टाकीं सोडूनियां । न धरिसी माया जरी माझी ॥2॥ बोलिला तो बोल करावा साचार । तरि लोक बरें ह्मणतील ॥3॥ करावा संसार लोक लाजे भेणें । वचनासी उणें येऊं नेदीं ॥4॥ तुह्मां आह्मां तैसें नाहीं ह्मणे तुका । होशील तूं सखा जीवलग ॥5॥ 3887 तू आह्मां सोयरा सज्जन सांगाति । तुजलागीं प्रीति चालो सदा ॥1॥ तूं माझा जिव्हाळा जीवाचा जिवलग । होसी अंतरंग अंतरींचा ॥ध्रु.॥ गण गोत मित्र तूं माझें जीवन । अनन्यशरण तुझ्या पांयीं ॥2॥ तुका ह्मणे सर्वगुणें तुझा दास । आवडे अभ्यास सदा तुझा ॥3॥ 3888 आवडेल तैसें तुज आळवीन । वाटे समाधान जीवा तैसें ॥1॥ नाहीं येथें कांहीं लौकिकाची चाड । तुजविण गोड देवराया ॥ध्रु.॥ पुरवीं मनोरथ अंतरींचें आर्त । धायेवरि गीत गाइप तुझे ॥2॥ तुका ह्मणे लेंकी आळवी माहेरा । गाऊं या संसारा तुज तैसें ॥3॥ 3889 माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥1॥ अबद्ध चांगलें गाऊं भलतैसें । कळलें हें जैसें मायबापा॥2॥ तुका ह्मणे मज न लगे वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥3॥ 3890 यालागीं आवडी ह्मणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥1॥ सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरि ॥ध्रु.॥ न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥2॥ न लगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरि ॥3॥ तुका ह्मणे कांहीं न वेचितां धन । जोडे नारायण नामासाटीं ॥4॥ 3891 झांकूनियां नेत्र काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं प्रेमभाव ॥1॥ रामनाम ह्मणा उघड मंत्र जाणा । चुकती यातना गर्भवास ॥ध्रु.॥ मंत्र यंत्र संध्या करिसी जडीबुटी । तेणें भूतसृष्टी पावसील ॥2॥ तुका ह्मणे ऐक सुंदर मंत्र एक । भवसिंधुतारक रामनाम ॥3॥ 3892 पापिया चांडाळा हरिकथा नावडे । विषयालागीं आवडें गाणें त्याला ॥1॥ ब्राह्मणा दक्षणा देतां रडे रुका । विषयालागीं फुका लुटीतसे ॥ध्रु.॥ वीतभरि लंगोटी नेदी अतीताला । खीरम्या देतो शाला भोरप्यासी ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या थुंका तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥3॥ 3893 क्षुधारथी अन्नें दुष्काळें पीडिलें । मिष्टान्न देखिलें तेणें जैसें ॥1॥ तैसें तुझे पायीं लांचावलें मन । झुरे माझा प्राण भेटावया ॥ध्रु.॥ मांजरें देखिला लोणियांचा गोळा । लावुनियां डोळा बैसलेंसे ॥2॥ तुका ह्मणे आतां झडी घालूं पाहें । पांडुरंगे माये तुझे पायीं ॥3॥ 3894 स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥1॥ दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥ रििद्ध सििद्ध मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस याची जीवें ॥2॥ तुका ह्मणे एके वेळे देइप भेटी । वोरसोनि पोटीं आलिंगावें ॥3॥ 3895 देव तिंहीं बळें धरिला सायासें । करूनियां नास उपाधीचा ॥1॥ पर्वपक्षी धातु धिःकारिलें जन । स्वयें जनादऩन ते चि जाले ॥2॥ तुका ह्मणे यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येइल कळों ॥3॥ 3896 भेटीवांचोनियां दुजें नाहीं चित्तीं । येणें काकुलती याजसाटीं ॥1॥ भेटोनियां बोलें आवडीचें गुज । आनंदाच्या भोजें जेवूं संगें ॥ध्रु.॥ मायलेकरासीं नाहीं दुजी परि । जेऊं बरोबरी बैसोनियां ॥2॥ तुका ह्मणे ऐसें अंतरींचें आर्त । यावें जी त्वरित नारायणा ॥3॥ 3897 आविसाचे आसे गळ गिळी मासा । फुटोनियां घसा मरण पावे ॥1॥ मरणाचे वेळे करी तळमळ । आठवी कृपाळ तये वेळीं ॥2॥ अंतकाळीं ज्याच्या नाम आलें मुखा । तुका ह्मणे सुखा पार नाहीं ॥3॥ 3898 जायाचें शरीर जाइऩल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥1॥ कृपेचे सागर तुह्मी संत सारे । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥ अनाथ अYाान कोणी नाहीं त्यासि । पायापें विठ्ठला ठेवीं मज ॥2॥ तुका ह्मणे ऐसें करावें निर्वाण । मग तो रक्षण करिल माझें ॥3॥ 3899 त्रासला हा जीव संसारींच्या सुखा । तुजविण सखा नाहीं कोणी ॥1॥ ऐसें माझें मनीं वाटे नारायणा । घालावी चरणावरि मिठी ॥ध्रु.॥ कइं तें सुंदर देखोनि रूपडें । आवडीच्या कोडें आळंगीन ॥2॥ नाहीं पूर्व पुण्य मज पापरासी । ह्मणोनि पायांसी अंतरलों ॥3॥ अलभ्य लाभ कैंचा संचितावेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥4॥ 3900 मोलाचें आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्यें होय लाभ याचा ॥1॥ अनंतजन्मींचे शेवट पाहतां । नर देह हातां आला तुझ्या ॥ध्रु.॥ कराल ते जोडी येइऩल कार्यासी । ध्यावें विठ्ठलासी सुखालागीं ॥2॥ सांचलिया धन होइऩल ठेवणें । तैसा नारायण जोडी करा ॥3॥ करा हरिभHी परलोकीं ये कामा । सोडवील यमापासोनियां ॥4॥ तुका ह्मणे करा आयुष्याचें मोल । नका वेचूं बोल नामेंविण ॥5॥ [[वर्ग:गाथा]] 0ikq3puv4y81sb192cms82romeeddq4 तुकाराम गाथा/ ३९०१ ते ४२०० 0 1546 36914 36886 2026-09-19T19:44:17Z QueerEcofeminist 1879 Restored revision 5052 by [[Special:Contributions/Rahuldeshmukh101|Rahuldeshmukh101]] ([[en:w:User:BrandonXLF/Restorer|Restorer]]) 36914 wikitext text/x-wiki 3901 काय सुख आहे वाउगें बोलतां । ध्यातां पंढरिनाथा कष्ट नाहीं ॥1॥ सर्वकाळ वाचे उच्चारितां हरि । तया सुखा सरि पाड नाहीं ॥ध्रु.॥ रामकृष्णरंगीं रसना रंगली । अमृताची उकळी नाम तुझें ॥2॥ तुका ह्मणे धन्य तयाचें वदन । जया नारायण ध्यानीं मनीं ॥3॥ 3902 कीर्त्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं आहे ॥1॥ भH जाय सदा हरि कीतिऩ गात । नित्यसेवें अनंत हिंडतसे ॥ध्रु.॥ त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासंगें गोविंद फिरतसे ॥2॥ नारद मंजुळ सुस्वरें गीत गाये । मागाअ चालताहे संगें हरि ॥3॥ तुका ह्मणे त्याला गोडी कीर्त्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ॥4॥ 3903 बाळेंविण माय क्षणभरि न राहे । न देखतां होये कासाविस ॥1॥ आणिक उदंड बुझाविती जरी । छंद त्या अंतरीं माउलीचा ॥ध्रु.॥ नावडती तया बोल आणिकाचे । देखोनियां नाचे माय दृष्टी ॥2॥ तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । आणिकांचे बोलीं चाड नाहीं ॥3॥ 3904 हरिचिया भHा नाहीं भयचिंता । दुःखनिवारिता नारायण ॥1॥ न लगे वाहणें संसारउद्वेग । जडों नेदी पांग देवराया ॥ध्रु.॥ असों द्यावा धीर सदा समाधान । आहे नारायण जवळी च ॥2॥ तुका ह्मणे माझा सखा पांडुरंग । व्यापियेलें जग तेणें एकें ॥3॥ 3905 दसरा दिवाळी तो चि आह्मां सन । सखे संतजन भेटतील ॥1॥ आमुप जोडल्या सुखाचिया राशी । पार या भाग्यासी न दिसे आतां ॥ध्रु.॥ धन्य दिवस आजि जाला सोनियाचा । पिकली हे वाचा रामनामें ॥2॥ तुका ह्मणे काय होऊं उतराइऩ । जीव ठेऊं पांयीं संतांचिये ॥3॥ 3906 खिस्तीचा उदीम ब्राह्मण कलयुगीं । महारवाडीं मांगीं हिंडतसे ॥1॥ वेवसाव करितां पर्वत मांगासी । ते पैं विटाळासी न मनिती ॥ध्रु.॥ मांगिणीशीं नित्य करीतसे लेखा । तोंडावरि थुंका पडतसे ॥2॥ आशा माया रांडा नांव हें कागदीं । आठवीना कधीं नारायण ॥3॥ तुका ह्मणे देह जालें पराधीन । पांडुरंगाविण गति नाहीं ॥4॥ 3907 जगीं ब्रह्मक्रिया खिस्तीचा व्यापार । हिंडे घरोघर चांडाळाचे ॥1॥ आंतेजा खिचडी घेताती मागून । गािळप्रधानि मायबहिणी ॥ध्रु.॥ उत्तमकुळीं जन्म क्रिया अमंगळ । बुडविलें कुळ उभयतां ॥2॥ तुका ह्मणे ऐसी कलयुगाची चाली । स्वाथॉ बुडविलीं आचरणें ॥3॥ 3908 हा चि माझा नेम धरिला हो धंदा । यावरि गोविंदा भेटी द्यावी ॥1॥ हा चि माझा ध्यास सदा सर्वकाळ । न्यावयासी मूळ येसी कधीं ॥ध्रु.॥ डोिळयांची भूक पहातां श्रीमुख । आलिंगणे सुख निवती भुजा ॥2॥ बहु चित्त ओढे तयाचिये सोइऩ । पुरला हाकांहीं नवस नेणें ॥3॥ बहुबहु काळ जालों कासावीस । वाहिले बहुवस कळेवर ॥4॥ तुका ह्मणे आतां पाडावें हें ओझें । पांडुरंगा माझें इयावरि ॥5॥ 3909 जेणें माझें हित होइल तो उपाव । करिसील भाव जाणोनियां ॥1॥ मज नाहीं सुख दुःख तया खंती । भावना हे चित्तीं नाना छंदें ॥ध्रु.॥ तोडीं हे संबंध तोडीं आशापाश । मज हो सायास न करितां ॥2॥ तुका ह्मणे मी तों राहिलों नििंश्चत । कवळोनि एकांतसुख तुझें ॥3॥ 3910 शिखा सूत्र तुझा गुंतला जमान । तंववरि तूं जाण श्रुतिदास ॥1॥ त्याची तुज कांहीं चुकतां चि नीत । होसील पतित नरकवासी ॥ध्रु.॥ बहु जालासी चतुर शाहणा । शुद्ध आचरणा चुकों नको ॥2॥ शिखा सूत्र याचा तोडीं तूं संबंध । मग तुज बाध नाहींनाहीं ॥3॥ तुका ह्मणे तरि वत्तूऩिन निराळा । उमटती कळा ब्रह्मींचिया ॥4॥ 3911 पतिव्रता ऐसी जगामध्यें मात । भोगी पांच सात अंधारीं ते ॥1॥ भ्रतारासी लेखी श्वानाचे समान । परपुरुषीं जाण संभ्रम तो ॥2॥ तुका ह्मणे तिच्या दोषा नाहीं पार । भोगील अघोर कुंभपाक ॥3॥ 3912 सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । सांटविल्याबीजास काय करी ॥1॥ अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देइल कोण काका त्याचा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं खायाची ते चाड । तरि कां लिगाड करुनी घेतोस ॥3॥ 3913 चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥1॥ देखवी दाखवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नका ॥ध्रु.॥ मानसाची देव चालवी अहंता । मी चि एक कर्त्ता ह्मणों नये ॥2॥ वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥3॥ तुका ह्मणे विठो भरला सबाहीं । तया उणें कांहीं चराचरीं ॥4॥ 3914 मायारूपें ऐसें मोहिलेंसे जन । भोगिती पतन नामाकर्में॥1॥ काय याची प्रीती करितां आदर । दुरावितां दूर तें चि भलें ॥ध्रु.॥ नाना छंद अंगीं बैसती विकार । छिळयेले फार तपोनिधि ॥2॥ तुका ह्मणे ऐसें सिकवितों तुज । आतां धरी लाज मना पुढें ॥3॥ 3915 जेजे कांहीं मज होइऩल वासना । तेते नारायणा व्हावें तुह्मीं ॥1॥ काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींची ॥ध्रु.॥ तुजविण मज कोण आहे सखा । जें सांगा आणिकां जीवभाव ॥2॥ अवघें पिशुन जालें असे जन । आपपर कोण नाठवे हें ॥3॥ तुका ह्मणे तूं चि जीवांचें जीवन । माझें समाधान तुझे हातीं ॥4॥ 3916 कैसी करूं आतां सांग तुझी सेवा । शब्दYाानें देवा नाश केला ॥1॥ आतां तुझें वर्म न कळे अनंता । तुज न संगतां बुडूं पाहें ॥ध्रु.॥ संध्या स्नान केली आचाराची नासी । काय तयापासीं ह्मणती एक ॥2॥ बुडविली भिH म्हणीते पाषाण । पिंडाचें पाळण स्थापुनियां ॥3॥ न करावी कथा ह्मणती एकादशी। भजनाची नासी मांडियेली ॥4॥ न जावें देउळा ह्मणती देवघरीं । बुडविलें या परी तुका ह्मणे ॥5॥ 3917 नमोनमो तुज माझें हें कारण । काय जालें उणें करितां स्नान ॥1॥ संतांचा मारग चालतों झाडूनि । हो का लाभ हानि कांहींतरि ॥ध्रु.॥ न करिसी तरि हेंचि कोडें मज । भिH गोड काज आणीक नाहीं ॥2॥ करीं सेवा कथा नाचेन रंगणीं । प्रेमसुखधणी पुरेल तों ॥3॥ महाद्वारीं सुख वैष्णवांचे मेळीं । वैकुंठ जवळी वसे तेथें ॥4॥ तुका ह्मणे नाहीं मुिHसवें चाड । हें चि जन्म गोड घेतां मज ॥5॥ 3918 होऊनि संन्यासी भगवीं लुगडीं । वासना न सोडी विषयांची ॥1॥ निंदिती कदान्न इिच्छती देवान्न । पाहाताती मान आदराचा ॥2॥ तुका ह्मणे ऐसें दांभिक भजन । तया जनादऩन भेटे केवीं ॥3॥ 3919 लांबवूनि जटा नेसोनि कासोटा । अभिमान मोटा करिताती ॥1॥ सर्वांगा करिती विभूतिलेपन । पाहाती मिष्टान्न भक्षावया ॥2॥ तुका ह्मणे त्यांचा नव्हे हा स्वधर्म । न कळतां वर्म मिथ्यावाद ॥3॥ 3920 कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ म्हणविती जगामाजी ॥1॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परि शंकरासी नोळखती ॥2॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥3॥ 3921 कौडीकौडीसाटीं फोडिताती शिर । काढूनि रुधिर मलंग ते ॥1॥ पांघरती चर्म लोहाची सांकळी । मारिती आरोळी धैर्यबळें ॥2॥ तुका ह्मणे त्यांचा नव्हे चि स्वधर्म । न कळे चि वर्म गोविंदाचें ॥3॥ 3922 दाढी डोइऩ मुंडी मुंडुनियां सर्व । पांघुरति बरवें वस्त्र काळें ॥1॥ उफराटी काठी घेऊनियां हातीं । उपदेश देती सर्वत्रासी॥2॥ चाळवुनी रांडा देउनियां भेष । तुका ह्मणे त्यास यम दंडी ॥3॥ 3923 होउनी जंगम विभूती लाविती । शंख वाजविती घरोघरीं ॥1॥ शिवाचें निर्माल्य तीर्था न सेविती । घंटा वाजविती पोटासाठीं ॥2॥ तुका ह्मणे त्यासी नाहीं शिवभिH । व्यापार करिती संसाराचा ॥3॥ 3924 लावूनियां मुद्रा बांधोनियां कंठीं । हिंडे पोटासाटीं देशोदेशीं ॥1॥ नेसोनि कोपीन शुभ्रवर्ण जाण । पहाती पक्वान्न क्षेत्रींचें तें ॥2॥ तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यापाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥3॥ 3925 ऐसे नाना भेष घेऊनी हिंडती । पोटासाटीं घेती प्रतिग्रह ॥1॥ परमार्थासी कोण त्यजी संवसार । सांगापां साचार नांव त्याचें ॥2॥ जन्मतां संसार त्यजियेला शुकें । तोचि निष्कळंक तुका ह्मणे ॥3॥ 3926 िस्त्रया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥1॥ यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥2॥ ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका ह्मणे ॥3॥ 3927 न लगती मज शब्दब्रह्मYाान । तुझिया दर्शनावांचूनियां॥1॥ ह्मणऊनि तुझें करितों चिंतन । नावडे वचन आणिकांचें ॥ध्रु.॥ काय ते महत्वी करावी मान्यता । तुज न देखतां पांडुरंगा ॥2॥ तुका ह्मणे तुज दिधल्यावांचूनि । न राहे त्याहूनि होइन वेडा ॥3॥ 3928 तुझा ह्मणोनियां दिसतों गा दीन । हा चि अभिमान सरे तुझा ॥1॥ अYाान बाळका कोपली जननी । तयासी निर्वाणीं कोण पावे ॥ध्रु.॥ तैसा विठो तुजविण परदेशी । नको या दुःखासीं गोऊं मज ॥2॥ तुका ह्मणे मज सर्व तुझी आशा । अगा जगदीशा पांडुरंगा ॥3॥ 3929 जन्म मृत्यू फार जाले माझ्या जीवा । ऐक माझा धांवा पांडुरंगा ॥1॥ सिणलों बहुत करितां येरझारा । रखुमाइऩच्या वरा पावें वेगीं ॥2॥ तुका ह्मणे तूं गा पतितपावन । घेइप माझा सीण जन्मांतर ॥3॥ 3930 आतां माझ्या दुःखा कोण हो सांगाती । रखुमाइऩचा पति पावे चि ना ॥1॥ कायविधा त्यानें घातलीसे रेखा । सुटका या दुःखा न होय चि ॥2॥ तुका ह्मणे माझी विसरूं नको चिंता । अगा पंढरिनाथा पाव वेगी ॥3॥ 3931 पंढरीसी जावें ऐसें माझें मनीं । विठाइऩ जननी भेटे केव्हां ॥1॥ न लगे त्याविण सुखाचा सोहळा । लागे मज ज्वाळा अिग्नचिया ॥2॥ तुका ह्मणे त्याचे पाहिलिया पाय । मग दुःख जाय सर्व माझें ॥3॥ 3932 तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥1॥ अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥2॥ तुका ह्मणे एक विठोबाचें नाम । आहे जवळी दाम नाहीं रुका ॥3॥ 3933 आलिया संसारा उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥1॥ देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥ देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥2॥ निमित्याचा धनी केला असे झणी । माझेंमाझें ह्मणोनि व्यर्थ गेला ॥3॥ तुका ह्मणे कां रे नाशवंतासाटीं । देवासवें आटी पाडितोसी ॥4॥ 3934 माय वनीं धाल्या धाये । गर्भ आंवतणें न पाहें॥1॥ तैसें पूजितां वैष्णव । सुखें संतोषतो देव ॥ध्रु.॥ पुत्राच्या विजयें । पिता सुखातें जाये ॥2॥ तुका ह्मणे अमृतसििद्ध । हरे क्षुधा आणि व्याधि ॥3॥ 3935 तुझें अंगभूत । आह्मी जाणतों समस्त ॥1॥ येरा वाटतसे जना । गुढारसें नारायणा ॥ध्रु.॥ ठावा थारा मारा । परचिया संव चोरा ॥2॥ तुका ह्मणे भेदा । करुनि करितों संवादा॥3॥ 3936 तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥1॥ ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥ बोलतों जें तोंडें । नाहीं अनुभविलें लंडें ॥2॥ दंड लाहें केला । तुका ह्मणे जी विठ्ठला ॥3॥ 3937 माते लेकरांत भिन्न । नाहीं उत्तरांचा सीन ॥1॥ धाडींधाडीं वो भातुकें । रंजविल्याचें कौतुकें ॥ध्रु.॥ करुनि नवल । याचे बोलिलों ते बोल ॥2॥ तुका ह्मणे माते । पांडुरंगे कृपावंते॥3॥ 3938 जरि न भरे पोट । तरि सेवूं दरकूट ॥1॥ परि न घलूं तुज भार । हा चि आमुचा निर्धार ॥ध्रु.॥ तुझें नाम अमोलिक। नेणती हे ब्रह्मादिक ॥2॥ ऐसें नाम तुझें खरें । तुका ह्मणे भासे पुरें॥3॥ 3939 सर्वस्वाची साटी । तरि च देवासवें गांठी ॥1॥ नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥ द्यावें तें चिं घ्यावें । ह्मणउनि घ्यावें जीवें ॥2॥ तुका ह्मणे उरी । मागें उगवितां बरी ॥3॥ 3940 गाढव शृंगारिलें कोडें । कांहीं केल्या नव्हे घोडें॥1॥ त्याचें भुंकणें न राहे । स्वभावासी करील काये ॥ध्रु.॥ श्वान शिबिके बैसविलें । भुंकतां न राहे उगलें ॥2॥ तुका ह्मणे स्वभावकर्म । कांहीं केल्या न सुटे धर्म ॥3॥ 3941 सेंकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें॥1॥ स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥ध्रु.॥ सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं Yाानपणाची मस्ती ॥2॥ तुका ह्मणे गाढव लेखा । जेथें भेटेल तेथें ठोका ॥3॥ 3942 आवडे सकळां मिष्टान्न । रोग्या विषा त्यासमान॥1॥ दर्पण नावडे तया एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥2॥ तुका ह्मणे तैशा खळा । उपदेशाचा कांटाळा ॥3॥ 3943 अखंड संत निंदी । ऐसी दुर्जनाची बुिद्ध ॥1॥ काय ह्मणावें तयासी । तो केवळ पापरासि ॥ध्रु.॥ जो स्मरे रामराम । तयासी ह्मणावें रिकामें ॥2॥ जो तीर्थव्रत करी । तयासी ह्मणावें भिकारी ॥3॥ तुका ह्मणे विंच्वाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगीं॥4॥ 3944 या रे नाचों अवघेजण । भावें प्रेमें परिपूर्ण ॥1॥ गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊनिं संतजना ॥ध्रु.॥ सुख साधु सुखासाटीं । नाम हरिनाम बोभाटीं ॥2॥ प्रेमासाटीं तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥3॥ पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी॥4॥ तुका ह्मणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥4॥ 3945 उपजलों मनीं । हे तों स्वामीची करणी ॥1॥ होइल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥ येइल अभय जरि । तरि हे आYाा वंदिन शिरीं ॥2॥ भिHप्रयोजना । प्रयोजावें बंदिजना॥3॥ यश स्वामिचिये शिरीं । दास्य करावें किंकरीं ॥4॥ तुका ह्मणे आळीकरा । त्यासी योजावें उत्तरा ॥5॥ 3946 माझें मन पाहे कसून । परि चित्त न ढळे तुजपासून॥1॥ कापुनि देइन शिर । पाहा कृपण कीं उदार ॥ध्रु.॥ मजवरि घालीं घण । परि मी न सोडीं चरण ॥2॥ तुका ह्मणे अंतीं । तुजवांचूनि नाहीं गति ॥3॥ 3947 भूमीवरि कोण ऐसा । गांजूं शके हरिच्या दासा॥1॥ सुखें नाचा हो कीर्त्तनीं । जयजयकारें गर्जा वाणी ॥ध्रु.॥ काळा सुटे पळ । जाती दुरितें सकळ ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं । सांगूं मानाची हे निति ॥3॥ 3948 जातीचा ब्राह्मण । न करितां संध्यास्नान ॥1॥ तो एक नांनवाचा ब्राह्मण । होय हीनाहूनि हीन ॥ध्रु.॥ सांडुनियां शािळग्राम । नित्य वेश्येचा समागम ॥2॥ नेघे संतांचें जो तीर्थ । अखंड वेश्येचा जो आर्थ ॥3॥ तुका ह्मणे ऐसे पापी । पाहूं नका पुनरपि ॥4॥ 3949 जालों जीवासी उदार । त्यासी काय भीडभार ॥1॥ करीन आडक्या घोंगडें । उभें बाजारीं उघडें ॥ध्रु.॥ जोंजों धरिली भीड । तोंतों बहु केली चीड ॥2॥ तुका ह्मणे मूळ । तुझें उच्चारीन कुळ ॥3॥ 3950 आह्मां हें चि काम । वाचे गाऊं तुझें नाम ॥1॥ आयुष्य मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । याचे ठायीं वेचूं वाणी ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जिवाच्या जिवलगा ॥3॥ 3951 मिळे हरिदासांची दाटी । रीग न होय शेवटी ॥1॥ तेथें म्या काय करावें । माझें कोणें आइकावें ॥ध्रु.॥ कैसें तुज लाजवावें । भH ह्मणोनियां भावें ॥2॥ नाचतां नये ताळीं । मज वाजवितां टाळी ॥3॥ अंतीं मांडिती भुषणें भूषणे । शरीर माझें दैन्य वाणें ॥4॥ तुका ह्मणे कमळापति । मज न द्यावें त्या हातीं॥5॥ 3952 जाणों नेणों काय । चित्तीं धरूं तुझे पाय ॥1॥ आतां हें चि वर्म । गाऊं धरूनियां प्रेम ॥ध्रु.॥ कासया सांडूं मांडूं। भाव हृदयीं च कोंडूं ॥2॥ तुका ह्मणे देवा । जन्मोजन्मीं मागें सेवा॥3॥ 3953 जाळें घातलें सागरीं । बिंदु न राहे भीतरी ॥1॥ तैसें पापियाचें मन । तया नावडे कीर्त्तन ॥ध्रु.॥ गाढव गंगेसी न्हाणिलें। जाउनि उकरडएावरि लोळे ॥2॥ प्रीती पोसिलें काउळें । जाउनि विष्ठेवरी लोळे ॥3॥ तुका ह्मणे तैसी हरी । कीरव्या नावडे कस्तुरी॥4॥ 3954 तरलों ह्मणऊनि धरिला ताठा । त्यासी चळ जाला फांटा ॥1॥ वांयांविण तुटे दोड । मान सुख इच्छी मांड ॥ध्रु.॥ ग्वाहीविण मात । स्थापी आपुली स्वतंत्र ॥2॥ तुका ह्मणे ऐसीं किती । नरका गेलीं अधोगती ॥3॥ 3955 कठिण नारळाचें अंग । बाहेरी भीतरी तें चांग ॥1॥ तैसा करी कां विचार । शुद्ध कारण अंतर ॥ध्रु.॥ वरि कांटे फणसफळा । माजि अंतरीं जिव्हाळा ॥2॥ ऊंस बाहेरी कठिण काळा । माजी रसाचा जिव्हाळा ॥3॥ मिठें रुचविलें अन्न । नये सतंत कारण ॥4॥ 3956 सकळतीर्थांहूनि । पंढरीनाथ मुगुटमणी ॥1॥ धन्यधन्य पंढरी । जे मोक्षाची अक्षय पुरी ॥ध्रु.॥ विश्रांतीचा ठाव । तो हा माझा पंढरीराव ॥2॥ तुका ह्मणे सांगतों स्पष्ट । दुजी पंढरी वैकुंठ॥3॥ 3957 भाते भरूनि हरिनामाचे । वीर गर्जती विठ्ठलाचे॥1॥ अनंतनामाची आरोळी । एक एकाहूनि बळी ॥ध्रु.॥ नाहीं आणिकांचा गुमान । ज्याचे अंकित त्यावांचून ॥2॥ रििद्ध सििद्ध ज्या कामारी। तुका ह्मणे ज्याचे घरीं ॥3॥ 3958 ज्याची जया आस । तयाजवळी त्या वास ॥1॥ येर जवळी तें दुरी । धेनु वत्स सांडी घरीं ॥ध्रु.॥ गोडी िप्रयापाशीं । सुख उपजे येरासी ॥2॥ तुका म्हणे बोल । घडे तयाठायीं मोल॥3॥ 3959 बाळ माते निष्ठ‍ होये । परि तें स्नेह करीत आहे॥1॥ तैसा तूं गा पुरुषोत्तमा । घडी न विसंबसी आह्मां ॥ध्रु.॥ नेणती भागली । कडे घेतां अंग घाली ॥2॥ भूक साहे ताहान । त्याचें राखे समाधान ॥3॥ त्याच्या दुःखें धाये । आपला जीव देऊं पाहे॥4॥ नांवें घाली उडी । तुका ह्मणे प्राण काढी ॥5॥ 3960 हें तों टाळाटाळीं । परि भोवताहे कळी ॥1॥ बरें नव्हेल शेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥ मुरगािळला कान । समांडिलें समाधान ॥2॥ धन्य ह्मणे आतां । येथें नुधवा माथां॥3॥ अबोलणा तुका । ऐसें कांहीं लेखूं नका ॥4॥ 3961 किती लाजिरवाणा । मरे उपजोनि शाहाणा ॥1॥ एका घाइप न करीं तुटी । न निघें दवासोइऩ भेटी ॥ध्रु.॥ सोसूनि आबाळी । घायाळ तें ढुंग चोळी ॥2॥ सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ॥3॥ 3962 कुरुवंडी करीन काया । वरोनि पायां गोजिरिया ॥1॥ बैसलें तें रूप डोळां । मन चाळा लागलें ॥ध्रु.॥ परतें न सरवे दुरि । आवडी पुरी बैसली ॥2॥ तुका ह्मणे विसावलों । येथें आलों धणीवरि ॥3॥ 3963 साधनाचे कष्ट मोटे । येथें वाटे थोर हें ॥1॥ मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥ दासा नव्हे कर्म दान। तन मन निश्चळ ॥2॥ तुका ह्मणे आत्मनिष्ट । भागे चेष्ट मनाची॥3॥ 3964 घेतां आणिकांचा जीव । तेव्हां कींव कराना ॥1॥ आपलें तें वरदळ नेदा । हें गोविंदा कृपणता ॥ध्रु.॥ सेवा तरी इच्छा सांग । चोरिलें अंग साहेना ॥2॥ तुका ह्मणे अरे धन्या । निसंतान्या विठोबा ॥3॥ 3965 आह्मां केलें गुणवंत । तें उचित राखावें ॥1॥ तुह्मांसी तों चाड नाहीं । आणिकां कांहीं सुखदुःखां ॥ध्रु.॥ दासांचें तें देखों नये । उणें काय होइल तें ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभरा । दृिष्ट करा सामोरी ॥3॥ 3966 अगत्य ज्या नरका जाणें । कीर्तनीं तों वीट मानी॥1॥ नावडेसा जाला बाप । आलें पाप वस्तीसि ॥ध्रु.॥ नारायण नाहीं वाचे । ते यमाचे अंदण ॥2॥ तुका ह्मणे अभHासी । माता दासी जग झोडी ॥3॥ 3967 आह्मी हरिचे हरिचे । सुर किळकाळा यमाचे ॥1॥ नामघोष बाण साचे । भाले तुळसी मंजुरेचे ॥ध्रु.॥ आह्मी हरिचे हरिचे दास । कलिकाळावरि घालूं कास ॥2॥ आह्मी हरिचे हरिचे दूत । पुढें पळती यमदूत ॥3॥ तुका ह्मणे आह्मांवरी । सुदर्शन घरटी करी ॥4॥ 3968 देवाचिये पायीं वेचों सर्व शHी । होतील विपित्त ज्याज्या कांहीं ॥1॥ न घेइप माझी वाचा पुढें कांहीं वाव । आणि दुजे भाव बोलायाचे ॥ध्रु.॥ मनाचे वांटणी चित्ताचा विक्षेप । राहो हा अनुताप आहे तैसा ॥2॥ तुका ह्मणे घेइप विठ्ठलाचा छंद । आनंदाचा कंद विस्तारेल ॥3॥ 3969 पांडुरंगा आतां ऐका हे विनंती । बहु माझे चित्तीं भय वाटे ॥1॥ नाहीं आइकिलें संतांचिया मुखें । तें या मज लोकें भडसाविलें ॥ध्रु.॥ विष्णुदासां गति नाहीं तरावया । ह्मणती गेले वांयां कष्टत ही ॥2॥ धिक्कारिती मज करितां कीर्तन । काय सांगों शीण ते कािळचा ॥3॥ तुका ह्मणे मज वाटतें उदास । काय करूं यास पांडुरंगा ॥4॥ 3970 वेढा वेढा रे पंढरी । मोर्चे लावा भीमातिरीं ॥1॥ चलाचला संत जन । करा देवासी भांडण ॥ध्रु.॥ लुटालुटा पंढरपूर। धरा रखुमाइऩचा वर ॥2॥ तुका ह्मणे चला । घाव निशानी घातला॥3॥ 3971 पहा ते पांडव अखंड वनवासी । परि त्या देवासी आठविती ॥1॥ प्रल्हादासी पिता करितो जाचणी । परि तो स्मरे मनीं नारायण ॥ध्रु.॥ सुदामा ब्राह्मण दरिद्रें पीडिला । नाहीं विसरला पांडुरंग ॥2॥ तुका ह्मणे तुझा न पडावा विसर । दुःखाचे डोंगर जाले तरी ॥3॥ 3972 निजसेजेची अंतुरी । पादलिया कोण मारी ॥1॥ तैसा आह्मासी उबगतां । तुका विनवितो संतां ॥ध्रु.॥ मूल मांडीवरी हागलें । तें बा कोणे रें त्यागिलें ॥2॥ दासी कामासी चुकली । ते बा कोणें रें विकली ॥3॥ पांडुरंगाचा तुका पापी । संतसाहें काळासि दापी ॥4॥ 3973 श्वानाचियापरी लोळें तुझ्या दारीं । भुंकों हरिहरि नाम तुझें ॥1॥ भुंकीं उठीं बैसें न वजायें वेगळा । लुडबुडीं गोपाळा पायांपाशीं ॥2॥ तुका ह्मणे आह्मां वर्म आहे ठावें । मागेन ते द्यावें प्रेमसुख ॥3॥ 3974 सोइरे धाइरे दिल्याघेतल्याचे । अंत हें काळीचें नाहीं कोणी ॥1॥ सख्या गोत्रबहिणी सुखाचे संगती । मोकलुनी देती अंतकाळीं ॥ध्रु.॥ आपुलें शरीर आपुल्यासी पारिखें । परावीं होतील नवल काइऩ ॥2॥ तुका ह्मणे आतां सोड यांची आस । धरीं रे या कास पांडुरंगा ॥3॥ 3975 जन्ममरणांची कायसी चिंता । तुझ्या शरणागतां पंढरीराया ॥1॥ वदनीं तुझें नाम अमृतसंजीवनी । असतां चक्रपाणी भय कवणा ॥ध्रु.॥ हृदयीं तुझें रूप बिंबलें साकार । तेथें कोण पार संसाराचा ॥2॥ तुका ह्मणे तुझ्या चरणांची पाखर । असतां किळकाळ पायां तळीं ॥3॥ 3976 क्षमाशस्त्र जया नराचिया हातीं । दुष्ट तयाप्रति काय करी ॥1॥ तृण नाहीं तेथें पडे दावािग्न । जाय तो विझोनि आपसया ॥2॥ तुका ह्मणे क्षमा सर्वांचें स्वहित । धरा अखंडित सुखरूप ॥3॥ 3977 याति गुणें रूप काय ते वानर । तयांच्या विचारें वर्ते राम ॥1॥ ब्रह्महत्यारासि पातकी अनेक । तो वंद्य वाल्मीक तिहीं लोकीं ॥2॥ तुका ह्मणे नव्हे चोरीचा व्यापार । ह्मणा रघुवीर वेळोवेळां ॥3॥ 3978 पानें जो खाइऩल बैसोनि कथेसी । घडेल तयासी गोहत्या ॥1॥ तमाखू ओढूनि काढला जो धूर । बुडेल तें घर तेणें पापें ॥ध्रु.॥ कीर्तनीं बडबड करील जो कोणी । बेडुक होउनी येइल जन्मा ॥2॥ जयाचिये मनीं कथेचा कंटाळा । होती त्या चांडाळा बहु जाच ॥3॥ जाच होती पाठी उडती यमदंड । त्याचें काळें तोंड तुका ह्मणे ॥4॥ 3979 कामांमध्यें काम । कांहीं ह्मणा रामराम । जाइल भवश्रम । सुख होइऩल दुःखाचें ॥1॥ कळों येइऩल अंतकाळीं । प्राणप्रयाणाचे वेळीं । राहाती निराळीं । रांडापोरें सकळ ॥ध्रु.॥ जीतां जीसी जैसा तैसा । पुढें आहे रे वोळसा । उगवुनि फांसा । काय करणें तें करीं ॥2॥ केलें होतें या चि जन्में । अवघें विठोबाच्या नामें । तुका ह्मणे कर्म । जाळोनियां तरसी ॥3॥ 3980 तुज मज ऐसी परी । जैसे तरंग सागरीं ॥1॥ दोहींमाजी एक जाणा । विठ्ठल पंढरीचा राणा ॥ध्रु.॥ देव भH ऐसी बोली । जंव भ्रांति नाहीं गेली ॥2॥ तंतु पट जेवीं एक । तैसा विश्वेंसीं व्यापक ॥3॥ 3981 कोठें गुंतलासी योगीयांचे ध्यानीं । आनंदकीर्तनीं पंढरीच्या ॥1॥ काय काज कोठें पडलीसे गुंती । कानीं न पडती बोल माझे ॥ध्रु.॥ काय शेषनशयनीं सुखनिद्रा आली । सोय कां सांडिली तुह्मी देवा ॥2॥ तुका ह्मणे कोठें गुंतलेती सांगा । किती पांडुरंगा वाट पाहूं ॥3॥ 3982 माउलीसी सांगे कोण । प्रेम वाढवी ताहानें ॥1॥ अंतरींचा कळवळा । करीतसे प्रतिपाळा ॥ध्रु.॥ मायबापाची उपमा। तुज देऊं मेघश्यामा ॥2॥ ते ही साजेना पाहातां । जीवलगा पंढरिनाथा ॥3॥ माय पाळी संसारीं । परलोक राहे दुरी ॥4॥ तैसा नव्हेसी अनंता । काळावरी तुझी सत्ता ॥5॥ तुका ह्मणे नारायणा। तुह्मां बहुत करुणा ॥6॥ 3983 कोड आवडीचें । पुरवीना बाळकाचें ॥1॥ तेव्हां कैसी ते माउली । जाणा काशासाटीं व्याली ॥ध्रु.॥ वत्साचिये आसे। धेनु धांवेना गोरसें ॥2॥ तुका ह्मणे धरि । बाळ टाकिलें वानरीं ॥3॥ 3984 भHांची सांकडीं स्वयें सोसी देव । त्यांपाशीं केशव सर्वकाळ ॥1॥ जये ठायीं कीर्तन वैष्णव करिती । तेथें हा श्रीपति उभा असे ॥2॥ तुका ह्मणे देव सर्वाठायीं जाला । भरुनी उरला पांडुरंग ॥3॥ 3985 तुझिया नामाचा विसर न पडावा । ध्यानीं तो राहावा पांडुरंग ॥1॥ सांगितला मंत्र श्रीरामनामाचा । सर्वकाळ वाचा हें चि बोले ॥ध्रु.॥ उफराटें नाम वाल्मीक बोलीला । तो ही वंद्य केला नारायणें ॥2॥ तुका ह्मणे मज तुझा चि भरवसा । धांवुनियां कैसा येसी देवा ॥3॥ 3986 अवघ्यां पातकांची मी एक रासी । अवघा तूं होसी सवाौत्तमु ॥1॥ जैसा तैसा लागे करणें अंगीकार । माझा सर्व भार चालविणें ॥ध्रु.॥ अवघें चि मज गििळयेलें काळें । अवघीं च बळें तुझे अंगीं ॥2॥ तुका ह्मणे आतां खुंटला उपाय । अवघे चि पाय तुझे मज ॥3॥ 3987 मूतिऩमंत देव नांदतो पंढरी । येर ते दिगांतरीं प्रतिमारूप॥1॥ जाउनियां वना करावें कीर्तन । मानुनी पाषाण विठ्ठलरूप ॥2॥ तुका मुख्य पाहिजे भाव । भावापासीं देव शीघ्र उभा ॥3॥ 3988 धरिल्या देहाचें सार्थक करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ॥1॥ लावीन निशान जावया वैकुंठा । माजवीन पेठा कीर्तनाच्या॥ध्रु.॥ नामाचिया नौका करीन सहस्रवरि । नावाडा श्रीहरि पांडुरंग ॥2॥ भाविक हो येथें धरा रे आवांका । ह्मणे दास तुका शुद्धयाति ॥3॥ 3989 अनुसरे त्यासी फिरों नेदी मागें । राहें समागमें अंगसंगें ॥1॥ अंगसंगें असे कर्मसाक्ष देव । जैसा ज्याचा भाव तैसा राहे ॥2॥ फळपाकीं देव देतील प्राणीयें । तुका ह्मणे नये सवें कांहीं ॥3॥ 3990 संसारीं असतां हरिनाम घेसी । तरीं च उद्धरसी पूर्वजेंसी ॥1॥ अवघीं च इंिद्रयें न येती कामा । जिव्हे रामनामा उच्चारीं वेगीं ॥ध्रु.॥ शरीरसंपित्त नव्हे रे आपुली । भ्रांतीची माउली अवघी व्यर्थ ॥2॥ तुका ह्मणे सार हरिनामउच्चार । ये†हवी येरझार हरीविण ॥3॥ 3991 सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे॥1॥ आणीक कांहीं इच्छा आह्मां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥ जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आह्मांसी सहज द्यावें आतां ॥2॥ तुका ह्मणे तुज ऐसे दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आह्मां ॥3॥ 3992 भHांहून देवा आवडे तें काइ । त्रिभुवनीं नाहीं आन दुजें ॥1॥ नावडे वैकुंठ क्षीराचा सागर । धरोनि अंतर राहे दासा॥ध्रु.॥ सर्वभावें त्याचें सर्वस्वें ही गोड । तुळसीदळ कोड करुनी घ्यावें॥2॥ सर्वस्वें त्याचा ह्मणवी विकला । चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥3॥ तुका ह्मणे भिHसुखाचा बांधिला । आणीक विठ्ठला धर्म नाहीं॥4॥ 3993 राम कृष्ण गोविंद नारायण हरी । केशवा मुरारी पांडुरंगा ॥1॥ लIमीनिवासा पाहें दिनबंधु । तुझा लागो छंदु सदा मज ॥2॥ तुझे नामीं प्रेम देइऩ अखंडित । नेणें तप व्रत दान कांहीं॥3॥ तुका ह्मणे माझें हें चि गा मागणें । अखंड ही गाणें नाम तुझें ॥4॥ 3994 हरी तुझें नाम गाइऩन अखंड । याविण पाखंड नेणें कांहीं ॥1॥ अंतरीं विश्वास अखंड नामाचा । कायामनेंवाचा देइप हें चि ॥2॥ तुका ह्मणे आतां देइप संतसंग । तुझे नामीं रंग भरो मना॥3॥ 3995 गाबाळाचे ग्रंथीं कां रे पडां सदा । मिथ्या भेदवादा वागवितां ॥1॥ संसारगाबाळीं पडसी निखळ । जालासी तूं खळ तेणें मना ॥ध्रु.॥ साधनसंकटीं गुंतसी कासया । व्यर्थ गा अपायामाजी गुंती ॥2॥ निर्मळ फुकाचें नाम गोविंदाचें । अनंतजन्माचे फेडी मळ ॥3॥ तुका ह्मणे नको करूं कांहीं कष्ट । नाम वाचे स्पष्ट हरि बोलें ॥4॥ 3996 भाव धरिला चरणीं ह्मणवितों दास । अहिनिऩशीं ध्यास करीतसें ॥1॥ करीतसें ध्यास हृदयीं सकळ । भाव तो सबळ धरियेला ॥2॥ धरिले निश्चळ न सोडीं ते पाय । तुका ह्मणे सोय करीं माझी ॥3॥ 3997 तुझें नाम गाया न सोपें डवळा । गाऊं कळवळा प्रेमाचिया ॥1॥ येइल आवडी जैसी अंतरींची । तैसी मनाची कीर्ती गाऊं ॥2॥ माझें मुख नामीं रंगो सर्वकाळ । गोविंद गोपाळ राम कृष्ण ॥3॥ अबद्ध चांगलें गाऊं जैसें तैसें । बाहे बाळ जैसें मायबापा ॥4॥ तुका ह्मणे मज न लावीं वांकडें । मी तुझें बोबडें बाळ तान्हें ॥5॥ 3998 आतां तुज मज नाहीं दुजेपण । दाखवीं चरण पांडुरंगा ॥1॥ तुज रूप रेखा नाम गुण नाहीं । एक स्थान पाहीं गांव सिंव ॥ध्रु.॥ नावडे संगाति तुजा दुजयाची । आपुल्या भHांची प्रीति तुह्मां ॥2॥ परि आह्मांसाटीं होसील सगुण । स्तंभासी फोडून जयापरि ॥3॥ तुका ह्मणें तैसें तुज काय उणें । देइप दरुषण चरणांचें ॥4॥ 3999 करणें तें हें चि करा । नरका अघोरा कां जातां॥1॥ जयामध्यें नारायण । शुद्धपण तें एक ॥ध्रु.॥ शरणागतां देव राखे। येरां वाखे विघ्नाचे ॥2॥ तुका ह्मणे लीन व्हावें । कळे भावें वर्म हें ॥3॥ 4000 आणीक नका करूं चेष्टा । व्हाल कष्टा वरपडी॥1॥ सुखें करा हरिकथा । सर्वथा हे तारील ॥ध्रु.॥ अनाथाचा नाथ देव। अनुभव सत्य हा ॥2॥ तुका ह्मणे बहुतां रिती । धरा चित्तीं सकळ॥3॥ 4001 मुखें सांगे ब्रह्मYाान । जन लोकाची कापितो मान॥1॥ Yाान सांगतो जनासी । नाहीं अनुभव आपणासी ॥ध्रु.॥ कथा करितो देवाची । अंतरीं आशा बहु लोभाची ॥2॥ तुका ह्मणे तो चि वेडा। त्याचें हाणूनि थोबाड फोडा ॥3॥ 4002 कांहीं दुसरा विचार । न लगे करावा चि फार ॥1॥ सेटएा ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥ध्रु.॥ पाप न लगे धुंडावें॥ पाहिजे तरि तेथें जावें ॥2॥ जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥3॥ गाइऩ ह्मसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥4॥ तुका ह्मणे पाहीं । तेथें पुण्या रीघ नाहीं ॥5॥ 4003 तुझी माझी आहे जुनी सोयरीक । आधीं बंधु लेंक मग जाले ॥1॥ वांटेकरी ह्मणून पुसती आतां । परि आहे सत्ता करीन ते ॥ध्रु.॥ लेंकीचें लेंकरूं नातु जाल्यावरी । मंगळा ही दुरि अंतरलों ॥2॥ बाइलेचा भाऊ पिसुना सोयरा । ह्मणउनि करा विनोद हा ॥3॥ आकुळीं तों करूं नये तें चि केलें । न बोलावें भलें तों चि आतां ॥4॥ न ह्मणसी लेंकी माउसी बहिणी । आह्मां केलें धणी पापाचें त्या ॥5॥ बहु पांचांजणी केली विटंबना । नये दाऊं जना तोंड ऐसें ॥6॥ तुका ह्मणे आधीं मूळ तें चि धरूं । मागील तें करूं उरी आतां ॥7॥ 4004 मागें बहुत जाले खेळ । आतां बळ वोसरलें ॥1॥ हालों नये चालों आतां । घट रिता पोकळ ॥ध्रु.॥ भाजल्याची दिसे घडी । पट ओढी न साहे ॥2॥ तुका ह्मणे पाहतां घडी । जगा जोडी अंगारा ॥3॥ 4005 आळस आला अंगा । धांव घालीं पांडुरंगा ॥1॥ सोसूं शरीराचे भाव । पडती अवगुणाचे घाव ॥ध्रु.॥ करावीं व्यसनें। दुरी येउनि नारायणें ॥2॥ जवळील दुरी । जालों देवा धरीं करीं॥3॥ ह्मणउनि देवा । वेळोवेळां करीं धावा ॥4॥ तुका ह्मणे पांडुरंगा । दुरी धरूं नका अंगा ॥5॥ 4006 झंवविली महारें । त्याची व्याली असे पोरें ॥1॥ करी संताचा मत्सर । कोपें उभारोनि कर ॥ध्रु.॥ बीज तैसें फळ । वरी आलें अमंगळ ॥2॥ तुका ह्मणे ठावें । ऐसें जालें अनुभवें॥3॥ 4007 पापी तो नाठवी आपुल्या संचिता । ठेवी भगवंता वरी बोल ॥1॥ भेइऩना करितां पापाचे डोंगर । दुर्जन पामर दुराचारी॥ध्रु.॥ नाठवी तो खळ आपुली करणी । देवासी निंदोनि बोलतसे ॥2॥ तुका ह्मणे त्याच्या तोंडा लागो काटी । नाहीं जगजेठी जया चित्तीं ॥3॥ 4008 आधीं देह पाहता वाव । कैचा प्रारब्धासी ठाव॥1॥ कां रे रडतोसी माना । लागें विठ्ठलचरणा ॥ध्रु.॥ दुजेपण जालें वाव। त्रिभुवनासि नाहीं ठाव ॥2॥ तुका ह्मणे खरे पाहें । विठ्ठल पाहोनियां राहें ॥3॥ 4009 िस्त्रया धन बा हें खोटें । नागवले मोठे मोठे ॥1॥ ह्मणोनि सांडा दोनी । सुख पावाल निदानीं ॥ध्रु.॥ सर्वदुःखासी कारण । हीं च दोन्हीचीं प्रमाण ॥2॥ आशा सर्वस्वें सांडावी । तेणें निजपदवी पावावी ॥3॥ देह लोभें नाडला । घाला यमाचा पडला॥4॥ तुका ह्मणे निरापेक्षा । कांहीं न धरावी अपेक्षा ॥5॥ 4010 जेंजें होआवें संकल्पें । तें चि पुण्य होय पाप ॥1॥ कारण तें मनापासीं । मेळविल्या मिळे रसीं ॥ध्रु.॥ सांडी मांडी हाली चाली । राहे तरि भली बोली ॥2॥ तुका ह्मणे सार । नांव जीवनाचे सागर ॥3॥ 4011 ओले मातीचा भरवसा । कां रे धरिशी मानसा ॥1॥ डोळे चिरीव चांगले । वृद्धपणीं सरवया जाले ॥ध्रु.॥ नाक सरळ चांगलें । येउन हनवटी लागलें ॥2॥ तुका ह्मणे आलें नाहीं । तंव हरिला भज रे कांहीं ॥3॥ 4012 तुह्मां सांगतों कलयुगा फळ । पुढें होइल ब्रह्मगोळ॥1॥ आह्मां ह्मणतील कंटक । ऐसा पाडिती दंडक ॥ध्रु.॥ िस्त्रया पूजुनि सरे देती । भलते िस्त्रयेसि भलते जाती ॥2॥ श्रेष्ठ वर्ण वेदविद्वांस। अंगीकारी मद्यमांस ॥3॥ चारी वर्ण अठरा याती । कवळ करिती एक पंHी ॥4॥ ह्मणती अंबेचा क्रीडाकल्लोळ । शिवरूप प्राणी सकळ ॥5॥ ऐसें होइल शकुन देतों । अगोदर सांगुन जातों ॥6॥ तुका सद्गुरुदास्य करी । सििद्ध पाणी वाहे घरीं ॥7॥ 4013 त्या हरिदासांची भेटी घेतां । नकाऩ उभयतासी जातां॥1॥ माते परीस थोरी कथा । भाड घेतां न लाजे ॥ध्रु.॥ देतां घेतां नरकवासी । उभयतांसी रवरव ॥2॥ तुका ह्मणे नरकगांवा । जाती हांवा धरोनि ॥3॥ 4014 देव गावा ध्यावा ऐसें जालें । परदेशी नाहीं उगलें । वडील आणि धाकुलें । नाहीं ऐसें जालें दुसरें तें ॥1॥ नाहीं लागत मुळीहूनि । सुहृदजन आणि जननी । लागल्या लागें त्यागें सांडूनि। लोभीये मांडणी संयोगाची ॥ध्रु.॥ शिव बाटला जीवदशे । बहुत ओतत आलें ठसें । हीन जालें भूषणाचें इच्छे । निवडती कैसे गुणागुण ॥2॥ आतां हे हुतांश तों बरें । अवघे एक च मोहरें । पिटिलियाविण नव्हे खरें । निवडें बरें जातिशुद्ध ॥3॥ तुका उतावेळ याजसाटीं । आहे तें निवेदीन पोटीं । आवडी द्यावी जी येथें लाटी । तुझी जगजेठी कीर्ती वाखाणीन ॥4॥ 4015 भोगी जाला त्याग । गीती गातां पांडुरंग । इंिद्रयांचा लाग । आह्मांवरूनि चुकला ॥1॥ करुनि ठेविलों निश्चळ । भय नाहीं तळमळ । घेतला सकळ । अवघा भार विठ्ठलें ॥ध्रु.॥ तळीं पिक्षणीचे परी । नखें चोंची चारा धरी । आणुनियां घरीं । मुखीं घाली बाळका ॥2॥ तुका ह्मणे ये आवडी । आह्मीं पांयीं दिली बुडी । आहे तेथें जोडी । जन्मांतरींचें ठेवणें ॥3॥ 4016 कुंकवाची ठेवाठेवी । बोडकादेवी काशाला ॥1॥ दिवस गमा भरा पोट । कां गे नेटनेटावा ॥ध्रु.॥ दिमाख हा कोणां दावा । लटकी जीवा चरफड ॥2॥ तुका ह्मणे झोंडगीं हो । काुंफ्दा कां हो कोरडी ॥3॥ 4017 तुझें प्रेम माझ्या हृदयीं आवडी । चरण न सोडीं पांडुरंगा ॥1॥ कासया सिनासि थोरिवां कारणें । काय तुझें उणें होइल देवा ॥ध्रु.॥ चातकाची चिंता हरली जळधरें । काय त्याचें सरे थोरपण ॥2॥ चंद्र चकोरांचा पुरवी सोहळा । काय त्याची कळा न्यून होय ॥3॥ तुका ह्मणे मज अनाथा सांभाळीं । हृदयकमळीं िस्थर राहें ॥4॥ 4018 आम्ही आइते जेवणार । न लगे सोसावे डोंगर । सुखाचा वेव्हार । तेणें चि वाढलें ॥1॥ ठेवा जोडला मिरासी । ठाव जाला पायांपासी । नव्हे आणिकांसी । रीघ तेथें यावया ॥ध्रु.॥ बळी दिला जीवभाव । नेणें आणिकांचे नांव । धरिला एक भाव । तो विश्वास फळला ॥2॥ तुका ह्मणे जालों बळी । आह्मी निकट जवळी । बोलिलों तें पाळीं । वचन स्वामी आमचें ॥3॥ 4019 न लगावी दिठी । माझी तुझे मुखवटी ॥1॥ आधीं पाउलें पाउलें । ते मी पाहेन तें भलें ॥ध्रु.॥ देइऩन हे काया । वरि सांडणें सांडाया ॥2॥ तुका ह्मणे देवा । बहु आवडसी जीवा ॥3॥ 4020 कोण आमचीं योगतपें । करूं बापें जाणावीं ॥1॥ गीत संतसंगें गाऊं । उभीं ठाऊं जागरणीं ॥ध्रु.॥ आमुचा तो नव्हे लाग । करूं त्याग जावया ॥2॥ तुका ह्मणे इंिद्रयांसी । ये चि रसीं रंगवूं ॥3॥ 4021 नाम तारक भवसिंधु । विठ्ठल तारक भवसिंधु ॥1॥ नामधारक तया अरि मित्रु । समता त्यागुनियां क्रोधु ॥ध्रु.॥ नामधारक तया । कदापि न घडे विषयाचा बाधु ॥2॥ ज्या नामें तरले शुकादिक । नारद संत मुनिजन साधु ॥3॥ जाणूनियां जे नसरें । ते नेणति जैसा गज अंधु ॥4॥ सहज तुकया । नाम चि जपतां स्वरुपीं वेधु ॥5॥ 4022 आह्मां वैष्णवांचा कुळधर्म कुळींचा । विश्वास नामाचा एका भावें ॥1॥ तरी च हरिचेदास ह्मणवितां श्लाघीजे । निर्वासना कीजे चित्त आधी ॥ध्रु.॥ गाऊं नाचूं प्रेमें आनंदें कीर्तनीं । भुिH मुिH दोन्ही न मगों तुज ॥2॥ तुका ह्मणे देवा ऐसी यांची सेवा। द्यावी जी केशवा जन्मोजन्मीं ॥3॥ 4023 पावलों हा देह कागतालिन्यायें । न घडे उपायें घडों आलें ॥1॥ आतां माझीं खंडीं देह देहांतरें । अभय दातारें देऊनियां॥ध्रु.॥ अंधऑयाचे पाठीं धनाची चरवी । अघटित तेंवि घडों आलें ॥2॥ तुका ह्मणे योग घडला बरवा । आतां कास देवा न सोडीं मी ॥3॥ 4024 कळे परि न सुटे गांठी । जालें पोटीं कुपथ्य ॥1॥ अहंकाराचें आंदणें जीव । राहे कींव केली ते ॥ध्रु.॥ हेंकडाची एकी च वोढी । ते ही खोडी सांगती ॥2॥ तुका ह्मणे सांगों किती । कांहीं चित्तीं न राहे ॥3॥ 4025 सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥1॥ ऐसे तंव तुह्मी नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेत ॥ध्रु.॥ फांटा जाला त्यासी नाहीं वोढा वारा । वेरसा चि खरा हाटो गुण ॥2॥ तुका ह्मणे नाहीं ज्याच्या बापा ताळा । तो देखे विटाळा संतां अंगीं ॥3॥ 4026 आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें ॥1॥ आतां दृष्टीपुढें ऐसा चि तूं राहीं । जों मी तुज पाहें पांडुरंगा ॥ध्रु.॥ लाचावलें मन लागलीसे गोडी । तें जीवें न सोडीं ऐसें जालें ॥2॥ तुका ह्मणे आह्मी केली जे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापें ॥3॥ 4027 तिळ एक अर्ध राइऩ । सीतबुंद पावे काइऩ । तया सुखा नाहीं । अंतपार पाहतां ॥1॥ ह्मणउनी करा लाहो । नका मागें पुढें पाहों । अवघ्यामध्यें आहों । सावचित्त तों ॥ध्रु.॥ तीथॉ न येती तुळणी । आजिया सुखाची धणी । जे कासी गयेहुनी । जीं आगळीं असती ॥3॥ येथें धरी लाज । वर्ण अभिमान काज । नाडला सहज । तुका ह्मणे तो येथें ॥3॥ 4028. विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरिलि ॥1॥ विठ्ठलविठ्ठल भावें ह्मणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंसी ॥ध्रु.॥ बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥2॥ तुका ह्मणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥3॥ 4029 भोळे भिHभाव धरिती मानसीं । त्यासी हृषीकेशी जवळी च ॥1॥ भाव नाहीं मनीं अभाविक सदा । त्याचिया मी खेदा काय सांगों ॥ध्रु.॥ गणिकेसारिकीं नामें उद्धरीलीं । सYाानें पडिलीं खटाटोपीं ॥2॥ तुका ह्मणे काय शुद्ध माझी जाति । थोर केली ख्याती हरिनामें ॥3॥ 4030 आड पडे काडी । तरि ते बहुत पाणी खोडी ॥1॥ दुर्जनाचे संगती । बहुतांचे घात होती ॥ध्रु.॥ एक पडे मासी । तरी ते बहु अन्न नासी ॥2॥ तुका ह्मणे रांड । ऐसी कां ते व्याली भांड॥3॥ 4031 पंढरीचें बा भूत मोटें । आल्या गेल्या झडपी वाटे॥1॥ तेथें जाऊं नका कोणी । गेले नाहीं आले परतोनि ॥2॥ तुका पंढरीसी गेला । पुन्हा जन्मा नाहीं आला ॥3॥ 4032 बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥1॥ सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥ उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥2॥ सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥3॥ तुका जाला वाणी । चुकवुनि चौ†यासीच्या खाणी ॥4॥ 4033 काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना । प्राथिऩतां ही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥1॥ आतां धांवधावें गा श्रीहरी । गेलों वांयां नाहीं तरी । न दिसे कोणी आवरी। आणीक दुजा तयासी ॥ध्रु.॥ न राहे एके ठायीं एकी घडी। चित्त तडतडा तोडी । घालूं पाहे बा हे उडी या भवडोहीं ॥2॥ आशा तृष्णा कल्पना पापिणी । घात मांडला माझा यांणीं । तुका ह्मणे चक्रपाणी । काय अजोनि पाहातोसी॥3॥ 4034 पाषाण परिस भूमि जांबूनद । वंशाचा संबंध धातयाचा॥1॥ सोनियाची पुरी समुद्राचा वेढा । समुदाय गाढा राक्षसांचा ॥ध्रु.॥ ऐसी सहस्र त्या सुंदरा कामिनी । माजी मुखरणी मंदोदरी ॥2॥ पुत्रपौत्राचा लेखा कोण करी । मुख्य पुत्र हरी इंद्रा आणी ॥3॥ चौदा चौकडिया आयुष्यगणना । बंधुवर्ग जाणा कुंभकर्ण॥4॥ तुका ह्मणे ज्याचे देव बांदवडी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥5॥ 4035 पापांचीं संचितें देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥1॥ पेरी कडू जिरें मागे अमृतफळ । आकाऩ वृक्षफळें कैसीं येती ॥ध्रु.॥ सुख अथवा दुःख भोग हो देहेचा । नास हा Yाानाचा न करावा ॥2॥ तुका ह्मणे आतां देवा कां रुसावें । मनासी पुसावें काय केलें ॥3॥ 4036 लाभ पुढें करी । घात नारायण वारी ॥1॥ ऐसी भHाची माउली । करी कृपेची साउली ॥ध्रु.॥ माय बाळकासी । जीव भाव वेची तैसी ॥2॥ तुका ह्मणे नाड । नाहीं शरणागता आड ॥3॥ 4037 आपुलेंसें करुनी घ्यावें । आश्वासावें नाभींसें ॥1॥ ह्णउनि धरिले पाय । आवो माय विठ्ठले ॥ध्रु.॥ कळलासे सीन चिंता । शम आतां करावा ॥2॥ तुका ह्मणे जीवीं वसें । मज नसें वेगळे ॥3॥ 4038 तुजविणं कांहीं । िस्थर राहे ऐसें नाहीं ॥1॥ कळों आलें बहुता रीती । पांडुरंगा माझ्या चित्तीं ॥ध्रु.॥ मोकलिली आस। सर्वभावें जालों दास ॥2॥ तुका ह्मणे तूं चि खरा । येर वाउगा पसारा ॥3॥ 4039 खोंकरी आधन होय पाकसििद्ध । हें तों घडों कधीं शके चि ना ॥1॥ खापराचे अंगीं घासितां परिस । न पालटे कीस काढिलिया ॥2॥ पालथे घागरी रिचवितां जळ । तुका ह्मणे खळ तैसे कथे ॥3॥ 4040 नागलें देखोनि चांगलें बोले । आपुलें वेचूनि त्याजपुढें खुले ॥1॥ अधमाचे ओंगळ गुण । उचित नेणें तो धर्म कोण॥ध्रु.॥ आर्तभूता न घली पाण्याचा चुळ । न मागे त्यासी घाली साखर गुळ ॥2॥ एकासी आड पडोनि होंकरी । एकासी देखोनि लपवी भाकरी ॥3॥ एकासी धड न बोले वाचा । एकासी ह्मणे मी तुझे बांदीचा ॥4॥ तुका ह्मणे ते गाढवपशु । लाभेंविण केला आयुष्यनाशु॥5॥ 4041 पिंडपोशकाच्या जळो Yाानगोष्टी । झणी दृिष्टभेटी न हो त्याची ॥1॥ नाहीं संतचिन्ह उमटलें अंगीं । उपदेशालागीं पात्र जाला ॥ध्रु.॥ पोहों सिणलें नये कासे लावितो आणिका । ह्मणावें त्या मूर्खा काय आतां ॥2॥ सिणलें तें गेलें सिणलियापासीं । जाली त्या दोघांसी एक गति ॥3॥ तुका ह्मणे अहो देवा दिनानाथा। दरुषण आतां नको त्याचें ॥4॥ 4042 संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥1॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभ चित्तीं । वरिवरि दाविती विरHी ॥2॥ आशापाशीं बांधोनि चित्त । ह्मणती जालों आह्मी मुH ॥3॥ त्यांचे लागले संगती । जाली त्यांसी ते चि गति ॥4॥ तुका ह्मणे शब्दYाानें । जग नाडियेलें तेणें॥5॥ 4043 दोष करूनि आह्मी पतित सिद्ध जालों । पावन मागों आलों ब्रीद तुझें ॥1॥ आतां पतिता तारावें कीं ब्रीद हें सोडावें । यांत जें पुरवे तें चि सांगा ॥ध्रु.॥ उद्धार तुमच्यानें नव्हे हो श्रीहरि। सोडा झडकरी ब्रीद आतां ॥2॥ तें ब्रीद घेउनी हिंडों दारोदारीं । सांगूं तुझी कीर्ती रे पांडुरंगा ॥3॥ देवें हारविलें ब्रीद हें सोडिलें । पतितें जिंकिलें आह्मीं देवा ॥4॥ तुका ह्मणे आह्मीं उठलों दैन्यवरि। विचारा श्रीहरी तुह्मी आतां ॥5॥ 4044 राम कृष्ण ऐसीं उच्चारितां नामें । नाचेन मी प्रेमें संतांपुढें ॥1॥ काय घडेल तें घडो ये सेवटीं । लाभ हाणी तुटी देव जाणे ॥ध्रु.॥ चिंता मोह आशा ठेवुनि निराळीं । देइऩन हा बळी जीव पायीं ॥2॥ तुका ह्मणे कांहीं उरों नेदीं उरी । सांडीन हे थोरी ओवाळोनी ॥3॥ 4045 देव धरी नाना सोंगें । नाम श्रेष्ठ पांडुरंग ॥1॥ तो हा गविळयाचे घरीं । नाम सारितो मुरारि ॥ध्रु.॥ धन्य यशोदेचें प्रारब्ध । नाचे अंगणीं गोविंद ॥2॥ ऐशा भHांसाटीं देवें । नाना धरियेलीं नांवें ॥3॥ होय दासांचा जो दास । तुका ह्मणे विठ्ठलास॥4॥ 4046 आइत्या भाग्या धणी व्हावे । केनें घ्यावें न सरे तें॥1॥ केणें आहे पंढरपुरीं । उधाराचें लाभीक ॥ध्रु.॥ बाखराची करुनी रीती । भरा पोतीं लवलाहीं ॥2॥ तुका ह्मणे संतांपाडें । करूं पुढें वाखती ॥3॥ 4047 जन्मोजन्मीं दास । व्हावें हे चि माझी आस ॥1॥ पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥ संतसमागम । अंगीं थिरावलें प्रेम ॥2॥ स्नान चंद्रभागे । तुका ह्मणे हें चि मागें ॥3॥ 4048 कां गा कोणी न ह्मणे पंढरीची आइऩ । बोलावितें पाहीं चाल नेटें ॥1॥ तेव्हां माझ्या मना होइल समाधान । जाइल सर्व शीण जन्मांतरिंचा ॥2॥ तुका ह्मणे माझी होशील माउली । वोरसोनि घाली प्रेमपान्हा ॥3॥ 4049 वेद अनंत बोलिला । अर्थ इतका चि शोधिला॥1॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ट नाम गावें ॥ध्रु.॥ सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतका चि निर्धार ॥2॥ अठरापुराणीं सिद्धांत । तुका ह्मणे हा चि हेत ॥3॥ 4050 मायेचा मारिला अंगीं नाहीं घाव । दुःखें तरी लव धडधडी ॥1॥ न लभे हा काळ न सुटे हातींचा । न बोलवे वाचा खोडावली ॥ध्रु.॥ न पवे धांवणें न पवे चि लाग । न चलती माग धरावया ॥2॥ भेणें तरि अंगा लावियेल्या राखा । परी त्यासी वाखा करीतसे ॥3॥ तुका ह्मणे नेदी हाका मारूं देवा । लोकापाठी हेवा लागलासे ॥4॥ 4051 धिग तो दुर्जन नाहीं भूतदया । व्यर्थ तया माया प्रसवली ॥1॥ कठिण हृदय तया चांडाळाचें । नेणे पराचें दुःख कांहीं ॥ध्रु.॥ आपुला का प्राण तैसे सकळ लोक । न करी विवेक पशु जैसा ॥2॥ तुका ह्मणे सुखें कापीतसे गळे । आपुलिया वेळे रडतसे ॥3॥ 4052 गरुडावरि बैसोनि येतो जगजेठी । त्याचे चरणीं मिठी घालूं चला ॥1॥ सांवळें रूपडें देखिलें लोचनीं । शंख चक्र दोन्ही शोभताहे ॥ध्रु.॥ पीतांबर झळके हे चि त्याची खूण । वाकी रुणझुण करिताती ॥2॥ गरुडाचा चपेटा असे नेटें । कस्तुरीमळवट शोभताहे ॥3॥ पदक एकावळी शोभताहे कंठीं । तुका ह्मणे मिठी घालूं चला ॥4॥ 4053 नाहीं पाक होत उफराटे चाली । बोलिली ते केली व्हावी नीत ॥1॥ नाहीं मानूं येत वांजटाचे बोल । कोरडे च फोल चवी नाहीं ॥ध्रु.॥ तरुवरा आधीं कोठें आहे फळ । चावटा बरळ ह्मणा त्यासी ॥2॥ तुका ह्मणे किती ठकलीं बापुडीं । गव्हा आहे गोडी मांडे पु†या ॥3॥ 4054 जाली हरिकथा रंग वोरसला । उचितासी आला पांडुरंग ॥1॥ वांटितो हें प्रेम उचिताचा दाता । घेइप रे तूं आतां धणीवरि ॥ध्रु.॥ प्रेम देऊनियां अवघीं सुखीं केलीं । जें होतीं रंगलीं विटलीं तीं ॥2॥ तुकें हें दुर्बळ देखियलें संतीं । ह्मणउनि पुढती आणियेलें ॥3॥ 4055 संकिल्पला तुज सकळ ही भाव । कोण एक ठाव उरला तेथें ॥1॥ इंिद्रयव्यापार जेंजें कांहीं कर्म । करितों ते धर्म सकळ तुझे ॥ध्रु.॥ माझें हित फार लागला विचार । तुज सर्व भार चालवणें ॥2॥ जो कांहीं लौकिक करिसी तो तुझा । अपमान पूजा कांहींतरि ॥3॥ तुका ह्मणे मी तों राहिलों नििंश्चत । तुज कळे हित तैसें करीं ॥4॥ 4056 भय नाहीं भेव । अनुतापीं नव्हतां जीव ॥1॥ जेथें देवाची तळमळ । तेथें काशाचा विटाळ ॥ध्रु.॥ उच्चारितां दोष । नाहीं उरों देत लेश ॥2॥ तुका ह्मणे चित्त । होय आवडी मििश्रत॥3॥ 4057 ध्यानीं ध्यातां पंढरिराया । मनासहित पालटे काया॥1॥ तेथें बोला कैची उरी । माझें मीपण जाला हरि ॥ध्रु.॥ चित्तचैतन्यीं पडतां मिठी । दिसे हरिरूप अवघी सृिष्ट ॥2॥ तुका ह्मणे सांगों काय । एकाएकीं हरिवृित्तमय ॥3॥ 4058 कोणा ही केंडावें हा आह्मां अधर्म । जोजो पावे श्रम तोतो देव ॥1॥ ह्मणउनि चित्ता सिकविलें वोजें । आतां हें चि दुजें न बोलावें ॥ध्रु.॥ हालविलें जरि परउपकारें । जिव्हे पाप खरें उपाधीचें॥2॥ तुका ह्मणे जीव प्रारब्धा आधीन । कोण वाहे सीण करुणा शोभे ॥3॥ 4059 देव तिळीं आला । गोडगोड जीव धाला ॥1॥ साधला हा पर्वकाळ । गेला अंतरींचा मळ ॥ध्रु.॥ पापपुण्य गेलें । एका स्नानें चि खुंटलें ॥2॥ तुका ह्मणे वाणी । शुद्ध जनादऩनीं जनीं ॥3॥ 4060 काय उणें मज पांडुरंगा पायीं । रििद्धसििद्ध ठायीं वोळगती ॥1॥ कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आह्मी ॥ध्रु.॥ स्वर्गसुखें आह्मीं केलीं पावटणी । पापपुण्यें दोन्ही उलंडिलीं ॥2॥ तुका ह्मणे घरीं आणिलें वैकुंठ । वसविली पेठ वैष्णवांची ॥3॥ 4061 माझें मागणें तें किती । दाता लIमीचा पति ॥1॥ तान्हेल्यानें पीतां पाणी । तेणें गंगा नव्हे उणी ॥ध्रु.॥ कल्पतरु जाला देता । तेथें पोटाचा मागता ॥2॥ तुका ह्मणे संतां ध्यातां । परब्रह्म आलें हाता ॥3॥ 4062 अर्भकाचे साटीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥1॥ तैसे संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगीं ॥ध्रु.॥ बालकाचे चाली । माता जाणुनि पाउल घाली ॥2॥ तुका ह्मणे नाव । जनासाटीं उदकीं ठाव ॥3॥ 4063 जन्मोजन्मींची संगत । भेटी जाली अकस्मात ॥1॥ आतां सोडितां सुटेना । तंतु प्रीतीचा तुटेना ॥ध्रु.॥ माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडिली पंढरिराया ॥2॥ तुका ह्मणे अंतीं । तुझी माझी एक गति ॥3॥ 4064 सांग पांडुरंगा मज हा उपाव । जेणें तुझे पाव आतुडति ॥1॥ न कळे हा निर्धार ब्रह्मादिकां पार । कायसा विचार माझा तेथें ॥2॥ तुका ह्मणे आतां धरुनियां धीर । राहूं कोठवर मायबापा ॥3॥ 4065 काय फार जरी जालों मी शाहाणा । तरी नारायणा नातुडसी ॥1॥ काय जालें जरी मानी मज मन । परि नातुडति चरण तुझे देवा ॥ध्रु.॥ काय जालें जरी जालों उदासीन । परि वर्म भिन्न तुझें देवा ॥2॥ काय जालें जरी केले म्यां सायास । ह्मणवितों दास भH तुझा ॥3॥ तुका ह्मणे तुज दाविल्यावांचून । तुझें वर्म कोण जाणे देवा ॥4॥ 4066 जातां पंढरीच्या मागॉ । काय वणूप सुखा मग ॥1॥ घडे लाभ लक्षकोटि । परब्रह्मीं होइल भेटी ॥ध्रु.॥ नाम गर्जत येती संत । त्यांच्या दर्शनें होइऩजे मुH ॥2॥ जो अलIय ब्रह्मादिकां । आला संनिध ह्मणे तुका ॥3॥ 4067 सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥1॥ तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तरलों दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥ जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हा चि नेम अहिनिऩशीं ॥2॥ तुका ह्मणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥3॥ 4068 मोल घेऊनियां कथा जरी करीं । तरी भंगो हरी देह माझा ॥1॥ माझी कथा करा ऐसें ह्मणें कोणा । तरी झडो जाणा जिव्हा माझी ॥ध्रु.॥ साहए तूं जालासी काय उणें तुपें । आणीक भूतांपें काय मागों ॥2॥ तुका ह्मणे सर्व सििद्ध तुझे पायीं । तूं माझा गोसावी पांडुरंगा ॥3॥ 4069 जरि हा हो कृपा करिल नारायण । तरी हें चि Yाान ब्रह्म होय ॥1॥ कोठोनियां कांहीं न लगे आणावें । न लगे कोठें जावें तरावया ॥ध्रु.॥ जरी देव कांहीं धरिल पैं चित्तीं । तरि हे चि होती दिव्य चक्षु ॥2॥ तुका ह्मणे देव दावील आपणा । तरि जीवपणा ठाव नाहीं ॥3॥ 4070 पांडुरंगा कृपाळुवा दयावंता । धरिसील सत्ता सकळ ही ॥1॥ कां जी आह्मांवरी आणिकांची सत्ता । तुह्मासी असतां जविळक ॥2॥ तुका ह्मणे पायीं केलें निवेदन । उचित हें दान करीं आतां ॥3॥ 4071 रात्री दिवस आह्मां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाहए जग आणि मन ॥1॥ जीवा ही आगोज पडती आघात । येऊनियां नित्य नित्य करी ॥2॥ तुका ह्मणे तुझ्या नामाचिया बळें । अवघीयांचें काळें केलें तोंड ॥3॥ 4072 होइन खडे गोटे । चरणरज साने मोठे । पंढरीचे वाटे । संतचरणीं लागेन ॥1॥ आणीक काय दुजें । म्या मागणें तुजपासीं । अविट तें सुख । भय नास नाहीं ज्यासी ॥ध्रु.॥ होइन मोचे वाहणा । पायीं सकळां संतजनां । मांजर सुकर सुणा । जवळी शेष घ्यावया ॥2॥ सांडोवा पायरी । वाहळ बावी गंगातिरी । होइन तयावरी । संतसज्जन चालती ॥3॥ लागें संतां पांयीं । ऐसा ठेवीं भलता ठायीं । तुका ह्मणे देइप । धाक नाहीं जन्माचा ॥4॥ 4073 माझिया जीवाचा मज निरधार । न करीं उत्तर जनासवें ॥1॥ आपुलें कारण साधों जी विचार । करावा हा धीर धरूनियां ॥ध्रु.॥ काय कराविया आणिका या युिH । काय नव्हे भिH विठोबाची ॥2॥ एक पुढें गेले वाट दावूनियां । मारग तो वांयां कोण सांडी ॥3॥ तुका ह्मणे माझी विठोबासी चिंता । भेइऩना सर्वथा न घडे तें ॥4॥ 4074 कासया व्हावें जीतांचि मुH । सांडुनियां थीतें प्रेमसुख ॥1॥ वैष्णवांचा दास जाला नारायण । काय त्या मिळोन असे काम ॥ध्रु.॥ काय त्या गांठीचें पडलें सुटोन । उगला चि बैसोन धीरु धरीं ॥2॥ सुख आह्मांसाटीं केलें हें निर्माण । निद।व तो कोण हाणे लाता ॥3॥ तुका ह्मणे मज न लगे सायोज्यता । राहेन या संतां समागमें ॥4॥ 4075 आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग॥1॥ कामधेनु कल्पतरु चिंतामणी । आवडीची धणी पुरवीती॥2॥ तुका ह्मणे जीवा थोर जालें सुख । नाठवे हे भूक तान कांहीं ॥3॥ 4076 लाडें भाकितों करुणा । तूं रे उदाराचा राणा ॥1॥ करिसी आमुचा सांभाळ । तूं रे माउली स्नेहाळ ॥ध्रु.॥ नाहीं चिंता रे आह्मांसी । तूं चि भार चालविसी ॥2॥ आह्मी जालों उदासीन । तूं चि करिसी जतन ॥3॥ आह्मां नाहीं जीवनास । तूं चि पुरविसी घास ॥4॥ तुका ह्मणे भलते सवें । जातां मागें मागें धांवे ॥5॥ 4077 आह्मां हें सकळ । तुझ्या पायांचें चि बळ ॥1॥ करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥ जयाचा जो भोग। सुख दुःख पीडा रोग ॥2॥ तुका ह्मणे देवा । तुझे पायीं माझा ठेवा ॥3॥ 4078 प्रपंच परमार्थ संपादोनि दोन्ही । एक ही निदानीं न घडे त्यासी ॥1॥ दोहीं पेंवावरी ठेवूं जातां हात । शेवटीं अपघात शरीराचा ॥2॥ तुका ह्मणे तया दोहींकडे धका । शेवटीं तो नरकामाजी पडे ॥3॥ 4079 संसारा आलिया एक सुख आहे । आठवावे पाय विठोबाचे ॥1॥ येणें होय सर्व संसार सुखाचा । न लगे दुःखाचा लेश कांहीं ॥ध्रु.॥ घेइऩल तयासी सोपें आहे सुख । बोलियेलें मुखें नारायण ॥2॥ सांगितली सोय करुणासागरें । तुह्मां कांहो बरें न वाटतें ॥3॥ तुका ह्मणे तेणें उपकार केला । भोऑया भाविकाला तरावया ॥4॥ 4080 आह्मां भय धाक कोणाचा रे पाहें । काळ मशक काय मानव हे ॥1॥ आह्मांसी ते काय चिंता या पोटाची । माउली आमुची पांडुरंग ॥ध्रु.॥ काय करावी हे कोणाची मान्यता । करितां अनंता कोण वारी ॥2॥ नाहीं शीण आह्मां जालें कवतुक । पुनीत हे लोक करावया ॥3॥ तुका ह्मणे खातों आनंदाचे लाडू । नका चरफडूं घ्या रे तुह्मी ॥4॥ 4081 तांबगी हें नाणें न चले ख†या मोलें । जरी हिंडविलें देशोदेशीं ॥1॥ करणीचें कांहीं न मने सज्जना । यावें लागे मना वृद्धांचिया ॥ध्रु.॥ हिरयासारिका दिसे शिरगोळा । पारखी ते डोळां न पाहाती ॥2॥ देऊनियां भिंग कामाविलें मोतीं । पारखिया हातीं घेतां नये ॥3॥ तुका ह्मणे काय नटोनियां व्यर्थ । आपुलें हें चित्त आपणा ग्वाही ॥4॥ 4082 चित्ता मिळे त्याचा संग रुचिकर । क्षोभवितां दूर तों चि भलें ॥1॥ ऐसी परंपरा आलीसे चालत । भलत्याची नीत त्यागावरी ॥ध्रु.॥ हो कां पिता पुत्र बंधु कोणी तेही । विजाति संग्रहीं धरूं नये ॥2॥ तुका ह्मणे सत्य पाळावें वचन । अन्यथा आपण करूं नये ॥3॥ 4083 आपुली कसोटी शुद्ध राखी कारण । आगीनें भूषण अधिक पुट ॥1॥ नाहीं कोणासवें बोलणें लागत । नििंश्चतीनें चित्तसमाधान ॥ध्रु.॥ लपविलें तें ही ढेंकरें उमटे । खोटियाचें खोटें उर फोडी ॥2॥ तुका ह्मणे निंदा स्तुति दोन्ही वाव । आपुलाला भाव फळा येतो ॥3॥ 4084 आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदुःख दोष अंगीं लागे ॥1॥ ऐसें मनीं वाहूं नयेती संकल्प । करूं नये पाप भांडवल ॥ध्रु.॥ क्लेशाची चित्तीं राहाते कांचणी । अग्नींत टाकोनी ठाव जाळी ॥2॥ तुका ह्मणे येणें घडे पुण्यक्षय । होणार तें होय प्रारब्धें चि ॥3॥ 4085 अYाानाची भिH इिच्छती संपत्ती । तयाचिये मती बोध कैंचा ॥1॥ अYाानाची पूजा कामिक भावना । तयाचिया ध्याना देव कैंचा ॥ध्रु.॥ अYाानाचें कर्म फळीं ठेवी मन । निष्काम साधन तया कैंचें ॥2॥ अYाानाचें Yाान विषयावरी ध्यान । ब्रह्म सनातन तया कैंचें ॥3॥ तुका ह्मणे जळो ऐसियांचे तोंड । अYाानाचें बंड वाढविती ॥4॥ 4086 गुळें माखोनियां दगड ठेविला । वर दिसे भला लोकाचारी ॥1॥ अंतरीं विषयाचें लागलें पैं पिसें । बाहिरल्या वेषें भुलवी लोकां ॥ध्रु.॥ ऐसिया डांभिकां कैची हरिसेवा । नेणे चि सद्भावा कोणे काळीं ॥2॥ तुका ह्मणे येणें कैसा होय संत । विटाळलें चित्त कामक्रोधें ॥3॥ 4087 आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें । काय हित केलें सांग बापा ॥1॥ फुकाचा चाकर जालासी काबाडी । नाहीं सुख घडी भोगावया ॥ध्रु.॥ दुर्लभ मनुष्यजन्म कष्टें पावलासी । दिला कुटुंबासी कामभोग ॥2॥ तुका ह्मणे ऐसें आयुष्य नासिलें । पाप तें सांचिलें पतनासी ॥3॥ 4088 अनंत लक्षणें वाणितां अपार । संताचें तें घर सांपडेना ॥1॥ जये घरीं संत राहती आपण । तें तुह्मां ठिकाण आतुडेना ॥ध्रु.॥ ठिकाण धरूनी पाहवे ते संत । उगा च अकांत करूं नये ॥2॥ संत होऊनियां संतांसी पाहावें । तरि च तरावें तुका ह्मणे ॥3॥ 4089 संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥1॥ हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥ जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥2॥ ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥3॥ तुका ह्मणे आह्मीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥4॥ 4090 पंढरीचा वास धन्य ते चि प्राणी । अमृताची वाणी दिव्य देहो ॥1॥ मूढ मतिहीन दुष्ट अविचारी । ते होती पंढरी दयारूप ॥ध्रु.॥ शांति क्षमा अंगीं विरिH सकळ । नैराश्य निर्मळ नारी नर ॥2॥ तुका ह्मणे नाहीं वर्णा अभिमान । अवघे जीवनमुH लोक ॥3॥ 4091 देखीचें तें Yाान करावें तें काइऩ । अनुभव नाहीं आपणासी ॥1॥ इंिद्रयांचे गोडी ठकलीं बहुतें । सोडितां मागुतें आवरेना ॥ध्रु.॥ युHीचा आहार नीतीचा वेव्हार । वैराग्य तें सार तरावया ॥2॥ नाव रेवािळतां घाला घाली वारा । तैसा तो पसारा अहंतेचा ॥3॥ तुका ह्मणे बुिद्ध आपुले अधीन । करी नारायण आतुडे तों ॥4॥ 4092 नर नारी बाळें अवघा नारायण । ऐसें माझें मन करीं देवा ॥1॥ न यो काम क्रोध द्वेष निंदा द्वंद । अवघा गोविंद निःसंदेह ॥ध्रु.॥ असावें म्यां सदा विषयीं विरH । काया वाचा चित्त तुझे पायीं ॥2॥ करोनियां साहए पुरवीं मनोरथ । व्हावें कृपावंत तुका ह्मणे ॥3॥ 4093 आपुल्या पोटासाटीं । करी लोकांचिया गोष्टी ॥1॥ जेणें घातलें संसारीं । विसरला तो चि हरी ॥ध्रु.॥ पोटा घातलें अन्न । न ह्मणे पतितपावन ॥2॥ मी कोठील आणि कोण । हें न कळे ज्यालागून ॥3॥ तुका ह्मणे नरस्तुति । करितो भाट त्रिजगतीं॥4॥ 4094 स्वयें आपण चि रिता । रडे पुढिलांच्या हिता ॥1॥ सेकीं हें ना तेंसें जालें । बोलणें तितुकें वांयां गेलें ॥ध्रु.॥ सुखसागरीं नेघे वस्ती । अंगीं Yाानपणाची मस्ती ॥2॥ तुका ह्मणे गाढव लेखा। जेथें भेटेल तेथें ठोका ॥3॥ 4095 जगीं कीतिऩ व्हावी । ह्मणोनी जालासी गोसावी॥1॥ बहुत केलें पाठांतर । वर्म राहिलेंसे दूर ॥ध्रु.॥ चित्तीं नाहीं अनुताप। लटिकें भगवें स्वरूप ॥2॥ तुका ह्मणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा ॥3॥ 4096 प्राHनाच्या योगें आळशावरी गंगा । स्नान काय जगा करूं नये ॥1॥ उभी कामधेनु मागिलें अंगणीं । तिसी काय ब्राह्मणीं वंदूं नये ॥ध्रु.॥ कोढियाचे हातें परिसें होय सोनें । अपवित्र ह्मणोन घेऊं नये ॥2॥ यातिहीन जाला गांवींचा मोकासी । त्याच्या वचनासी मानूं नये ॥3॥ भावारूढ तुका मुद्रा विठोबाची । न मनी तयांचीं तोंडें काळीं ॥4॥ 4097 बोलिलों उत्कषॉ । प्रेमरस दाशत्वें ॥1॥ साच करिता नारायण । जया शरण गेलों तो ॥ध्रु.॥ समर्थ तो आहे ऐसा । धरिली इच्छा पुरवी ॥2॥ तुका ह्मणे लडिवाळाचें । द्यावें साचें करूनियां ॥3॥ 4098 विचा केला ठोबा । ह्मणोनि नांव तो विठोबा ॥1॥ कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥ शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग जाला ॥2॥ तुका ह्मणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥3॥ 4099 भ्रतारअंगसंगें सुखाची वेवस्था । आधीं तों सांगतां नये कोणा ॥1॥ तथापि सांगणें कुमारिकेपाशीं । ते काय मानसीं सुख मानी ॥ध्रु.॥ तैसा आत्मबोध आधीं बोलों नये । बोलासी तो काय सांपडेल ॥2॥ तथापि सांगणें बहिर्मुखापाशीं । तो काय संतोषासी मूळ होय ॥3॥ तुका ह्मणे संत सुखाचे विभागी । ब्रह्मानंद जगीं साधुरूपें ॥4॥ 4100 कलयुगामाजी थोर जालें बंड । नष्ट लोक लंड जाले फार ॥1॥ न धरिती सोय न पुसती कोणा । येतें जैसें मना तैसें चाले ॥ध्रु.॥ सज्जनाचा वारा टेकों नेदी द्वारा । ऐसिया पामरा तारी कोण ॥2॥ विश्वास तयाचा बैसेना कोठें ही । स्तुति निंदा पाहीं जीवीं धरी ॥3॥ तुका ह्मणे कैसें केलें नारायणें । जाणावें हें कोणें तयाविण ॥4॥ 4101 आपुली बुटबुट घ्यावी । माझी परताप द्यावी ॥1॥ आपुला मंत्र नव्हे बरा । माझा बइऩल चुकला मोरा ॥2॥ तुका ह्मणे ऐशा नरा । परिस न झोंबे खापरा ॥3॥ 4102 भावभिHवादें करावें कीर्तन । आशाबधी मन करूं नये ॥1॥ अन्न पाणी धन द्रव्य नारायण । विठ्ठला वांचून बोलूं नये ॥ध्रु.॥ सप्रेम करावें देवाचें कीर्तन । भय द्या सोडून शरीराचें॥2॥ तरी मग जोडे विठ्ठलनिधान । केलिया कीर्तन सििद्ध पावे ॥3॥ देव जोडिलिया तया काय उणें । तुका ह्मणे मन धीट करा ॥4॥ 4103 चोरासी चांदणें वेश्येसी सेजार । परिसेंसी खापर काय होय ॥1॥ दुधाचे आधणीं वैरिले पाषाण । कदा काळीं जाण पाकनव्हे ॥2॥ तुका ह्मणे जरि पूर्वपुण्यें सििद्ध । तरि च राहे बुिद्ध संतसंगीं॥3॥ 4104 रोगिया मिष्टान्न मर्कटा चंदन । कागासी लेपन कर्पूराचें ॥1॥ निर्नासिका जैसा नावडे आरिसा । मूर्खालागीं तैसा शास्त्रबोध ॥ध्रु.॥ दास तुका ह्मणे विठ्ठलउदारें । अYाानअंधारें दूरी केलें ॥2॥ 4105 मथनासाटीं धर्माधर्म । त्याचें वर्म नवनीत ॥1॥ तें चि तें घाटूं नये । आलें जाय नासूनि ॥ध्रु.॥ सांभाळावें वरावर । वर्म दूर न वजावें ॥2॥ तुका ह्मणे घालें पोट । मग बोटचांचणी॥3॥ 4106 माझा घात पात अथवा हित फार । अवघा विचार तुझ्या हातीं ॥1॥ ठेवुनि जीव भाव तुझ्या ठायीं चित्त । राहिलों निवांत पांडुरंगा ॥ध्रु.॥ चित्ताचा चाळक बुद्धीचा जनिता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥2॥ तुका ह्मणे काय करिसी तें पाहीन । ठेविसी राहीन सुखें तेथें ॥3॥ 4107 संतपाउलें साजिरीं । गंगा आली आह्मांवरी ॥1॥ जेथें पडे रजधुळी । तेथें करावी अंघोळी ॥ध्रु.॥ स्वेतबंद वाराणसी। अवघीं तीथॉ तयापासीं ॥2॥ तुका ह्मणे धन्य जालों । संतसागरीं मिळालों ॥3॥ 4108 न घडे मायबापें बाळकाचा घात । आपणादेखत होऊं नेदी ॥1॥ कां मी मनीं चिंता वाहूं भय धाक । काय नव्हे एक करितां तुज ॥ध्रु.॥ वर्म जाणे त्याच्या हिताचे उपाय । तान भूक वाहे कडिये खांदीं ॥2॥ तुका ह्मणे तूं गा कृपावंत भारी । ऐसें मज हरी कळों आलें ॥3॥ 4109 करावें कीर्तन । मुखीं गावे हरिचे गुण ॥1॥ मग कांहीं नव्हे बाधा । काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ध्रु.॥ शांतिखड्ग हातीं। काळासी ते नागविती ॥2॥ तुका ह्मणे दाता सखा । ऐसा अनंतासारिखा ॥3॥ 4110 तुझी कीर्ती सांगों तुजपुढें जरी । ब्रह्मांडीं ही हरी माइऩना ते ॥1॥ मेरूची लेखणी सागराची शाइऩ । कागद हा मही न पुरे चि ॥ध्रु.॥ अनंत अपार आपंगिले भH । माझें चि संचित ओडवेना ॥2॥ तुका ह्मणे तुह्मां बोल नाहीं देवा । पामरें म्यां सेवा केली नाहीं ॥3॥ 4111 काय साधनाच्या कोटी । केल्या आटी होती त्या॥1॥ देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥ केले होते चिंता श्रम । उपरम न होतां ॥2॥ तुका ह्मणे कळों आलें । सर्व जालें आपरूप ॥3॥ 4112 तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥1॥ काय येणें उणें आह्मां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥ नोळखे तानुलें माय ऐसी कोण । वोरसे देखून शोक त्याचा ॥2॥ जो नाहीं देखिला याचक नयनीं । तो पावे घेउनि लज्जा दान ॥3॥ नामासाटीं प्राण सांडियेला रणीं । शूर ते भांडणीं न फिरती ॥4॥ तुका ह्मणे आह्मी गातां गीतीं भला । भेटूनी विठ्ठला काय चाड ॥5॥ 4113 कृपेचे सागर हे साधुजन । तिंहीं कृपादान केलें मज॥1॥ बोबडे वाणीचा केला अंगीकार । तेणें माझा िस्थर केला जीव ॥ध्रु.॥ तेणें सुखें मन िस्थर जालें ठायीं । संतीं दिला पायीं ठाव मज ॥2॥ नाभी नाभी ऐसें बोलिलों वचन । तें माझें कल्याण सर्वस्व ही ॥3॥ तुका ह्मणे जालों आनंदनिर्भर । नाम निरंतर घोष करूं ॥4॥ 4114 भHीचें वर्म जयाचिये हातीं । तया घरी शांति दया ॥1॥ अष्टमासििद्ध वोळगती द्वारीं । न वजती दुरी दवडितां॥ध्रु.॥ तेथें दुष्ट गुण न मिळे निशेष । चैतन्याचा वास जयामाजी ॥2॥ संतुष्ट चित्त सदा सर्वकाळ । तुटली हळहळ त्रिगुणाची ॥3॥ तुका ह्मणे येथें काय तो संदेह । आमचें गौरव आह्मी करूं ॥4॥ 4115 साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥1॥ साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥2॥ तुका ह्मणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥3॥ 4116 संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥1॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥2॥ शब्दYाानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥3॥ तुका ह्मणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥4॥ 4117 तुझें वर्म आह्मां कळों आलें सुखें । संतांचिया मुखें पांडुरंगा ॥1॥ अवघा चि नट वाउगा पसारा । चेइऩला तूं खरा तूं चि एक ॥ध्रु.॥ ह्मणउनि देहबुिद्ध नासिवंता । नातळे या चित्ता नेदावया ॥2॥ सोय हे लागली पुढिलांची वाट । पावले जे नीट तुजपाशीं ॥3॥ तुका ह्मणे नाहीं कोणासवें काज । बोलायाचें मज अंतरींचें ॥4॥ 4118 पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥1॥ जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥ अधिकार जाती वर्णधर्मयाती । ठाव नाहीं सत्यअसत्याशी ॥2॥ जन वन भिन्न आचेत चळण । नाहीं दुजेपण ठाव यासी ॥3॥ तुका ह्मणें देह वाइऩलें विठ्ठलीं । तेव्हां च घडली सर्व पूजा ॥4॥ 4119 संकोचतो जीव महkवाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥1॥ कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥ तुमचे चरण पावविलों सेवा । ह्मणउनि हेवा हा चि करीं ॥2॥ विनउनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचें॥3॥ 4120 देव कैंचा तया दुरी । भाका बरी करुणा ॥1॥ आळवित्या न लगे धर । माय जाणे रे भातुकें ॥ध्रु.॥ नावे तरी ज्याचा भार । पैल पार जवळी त्या ॥2॥ आतां परदेशी तुका । जाला लोकांवेगळा ॥3॥ 4121 भिH ज्याची थोडी । पूर्ण विषयांची गोडी ॥1॥ तो नर चि नव्हे पाहीं । खर जाणावा तो देहीं ॥ध्रु.॥ भजन पूजन ही नेणे । काय स्वरूपासी जाणे ॥2॥ तुका ह्मणे त्याला । भोवंडून बाहेर घाला ॥3॥ 4122 समुद्र हा पिता बंधु हा चंद्रमा । भगिनी ते रमा शंखाची या ॥1॥ मेहुणा जयाचा द्वारकेचा हरि । शंख दारोदारीं भीक मागे ॥2॥ दुष्ट हें जाणावें आपुलें स्वहित । तुका ह्मणे मात ऐसी आहे ॥3॥ 4123 भवाचिया संगें बहु च नाडिले । किळकाळें पाडिले तोंडघसीं ॥1॥ तया भवसंगें गुंतलासी वांयां । धन पुत्र जाया भुलों नको ॥ध्रु.॥ जेजे घडी जाय तेते काळ खाय । प्राण्या तरणोपाय काय केला ॥2॥ तुका ह्मणे करीं सर्व ही तूं त्याग । अपाअ हें सर्वांग जगदीशीं ॥3॥ 4124 रुचे सकळा मिष्टान्न । रोग्या विखाच्या समान॥1॥ तरि कां तया एकासाटीं । काम अवघें करणें खोटीं ॥ध्रु.॥ दर्पण नावडे एका । ठाव नाहीं ज्याच्या नाका ॥2॥ तुका ह्मणे खळा । उपदेशाचा कांटाळा ॥3॥ 4125 जागा घरटी फिरे तस्कराची दिवसाराती । नीदसुरें नाडिलीं असो मागों किती ॥1॥ हाट करी सकळ जन । वस्तु करा रे जतन ॥ध्रु.॥ हुशार ठायीं । निजनिजेलिया पाहीं ॥2॥ सावचित्त असे खरा । लाभ घेउन जाये घरा ॥3॥ तराळ राळ बोंबें उतराइऩ। राखा आपुलिया भाइऩ ॥4॥ हरिच्या नामीं घालूं जागा । तुका ह्मणे हुशार गा ॥5॥ 4126 संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली॥1॥ गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥2॥ तुका ह्मणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥3॥ 4127 चित्तीं तुझे पाय डोळां रूपाचें ध्यान । अखंड मुखीं नाम वर्णावे गुण ॥1॥ हें चि एक तुह्मां देवा मागणें दातारा । उचित तें करा माझा भाव जाणूनि ॥ध्रु.॥ खुंटली जाणींव माझें बोलणें आतां । करूं यावी तैसी करावी बाळकाची चिंता ॥2॥ तुका ह्मणे आतां नको देऊं अंतर । न कळे पुढें काय बोलों विचार॥3॥ 4128 संतांच्या पादुका घेइऩन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥1॥ भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सििद्ध पाय हरिदासांचे ॥ध्रु.॥ ध्यानगति मति आसन समाधि । हरिनाम गोविंदीं प्रेमसुख ॥2॥ नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊं गीतीं ॥3॥ सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका ह्मणे संतमहंतपाय ॥4॥ 4129 हरिजनीं प्राण विकली हे काया । अंकिला मी तया घरीं जालों ॥1॥ ह्मणियें सत्वर करीन सांगतां । घेइऩन मी देतां शेष त्यांचें ॥ध्रु.॥ आस करूनियां राहेन अंगणीं । उचिष्टाची धणी घ्यावयासी ॥2॥ चालतां ते मागाअ चरणीचे रज । उडती सहज घेइन आतां ॥3॥ दुरि त्यांपासूनि न वजें दवडितां । तुका ह्मणे लाता घेइन अंगीं ॥4॥ 4130 पुण्य फळलें बहुतां दिवसां । भाग्यउदयाचा ठसा । जाला सन्मुख तो कैसा । संतचरण पावलों ॥1॥ आजि फिटलें माझें कोडें । भवदुःखाचें सांकडें । कोंदाटलें पुढें । ब्रह्म सावळें॥ध्रु.॥ आलिंगणें संतांचिया । दिव्य जाली माझी काया । मस्तक पाया । वरी त्यांच्या ठेवितां ॥2॥ तुका ह्मणे धन्य झालों । सुखें संतांचिया धालों । लोटांगणीं आलों । पुढें भार देखोनी ॥3॥ 4131 ठाव देऊनिया राखें पायापासीं । मी तों आहें रासी पातकाची ॥1॥ पातकाची रासी ह्मणतां लागे वेळ । ऐके तो कृपाळ नारायण ॥ध्रु.॥ नारायणनामें अवघें सांग जालें । असंग चि केलें एकमय ॥2॥ एकमय जालें विठोबाच्या नामें । भेदाभेद कर्म आणिक कांहीं ॥3॥ तुका ह्मणे चित्तीं चिंतिलें जें होतें । तें होय आपैतें नामें याच्या ॥4॥ 4132 आतां आह्मां भय नाहीं बा कोणाचें । बळ विठोबाचें जालें असे ॥1॥ धीर दिला आह्मां येणें पांडुरंगें । न पांगों या पांगें संसाराच्या ॥2॥ तुका ह्मणे माझा कैवारी हा देव । नाहीं भय भेव त्याच्या संगें ॥3॥ 4133 भिH आह्मी केली सांडुनी उद्वेग । पावलों हें सांग सुख याचें ॥1॥ सुख आह्मां जालें धरितां यांचा संग । पळाले उद्वेग सांडूनिया ॥2॥ तुका ह्मणे सुख बहु जालें जिवा । घडली या सेवा विठोबाची ॥3॥ 4134 शास्त्रYा हो Yााते असती बहुत । परि नाहीं चित्त हाता आलें ॥1॥ क्षणा एका साटीं न धरवे धीर । तेणें हा रघुवीर अंतरतो ॥ध्रु.॥ तोळाभर सोनें रतिभार राइऩ । मेळविल्या पाहीं नास होतो ॥2॥ हरीचे अंकित असती विरळागत । तयांसी अच्युत कृपा करी ॥3॥ तुका ह्मणे काय धुडवण्या गोष्टी । जंव नाहीं गांठी चित्त आलें ॥4॥ 4135 इंिद्रयांसी नेम नाहीं । मुखीं राम ह्मणोनि काइऩ ॥1॥ जेविं मासीसंगें अन्न । सुख नेदी तें भोजन ॥ध्रु.॥ कीर्तन करावें । तैसें करूनी दावावें ॥2॥ हें तों अंगीं नाहीं चिन्हें । गाइलें वेश्येच्या ढव्यानें ॥3॥ तुका ह्मणे नका रागा । संत शिवूं नेदिती अंगा ॥4॥ 4136 न लगे देवा तुझें आह्मांसी वैकुंठ । सायुज्याचा पट न लगे मज ॥1॥ देइप तुझें नाम मज सर्वकाळीं । मागेन वनमाळीहें चि तुज ॥ध्रु.॥ नारद तुंबर उद्धव प्रल्हाद । बळी रुक्मांगद नाम ध्याती ॥2॥ सिद्ध मुनिगण गंधर्व किन्नर । करिताती गजर रामनामें॥3॥ तुका ह्मणे हरी देइप तुझें नाम । अखंडित प्रेम हें चि द्यावें ॥4॥ 4137 पावलों प्रसाद इच्छा केली तैसी । जालें या चित्तासी समाधान ॥1॥ मायबाप माझा उभा कृपादानी । विटे सम जोडूनि पादांबुजें ॥ध्रु.॥ सांभाळासी येऊं नेदी च उणीव । अधिकारगौरव राखे तैसें ॥2॥ तुका ह्मणे सर्व अंतर्बाहए आहे । जया तैसा राहे कवळूनी ॥3॥ 4238 होतें तैसें पायीं केलें निवेदन । अंतरलों दिन बहुत होतों ॥1॥ संबोखुनी केलें समाधान चित्त । वोगरुणि भात प्रेमरस॥ध्रु.॥ नामरत्नमणी करूनी भूषण । अळंकारमंडण माळा दिली ॥2॥ तुका ह्मणे सुखें जालों निरामय । नामीं नामसोय निमग्नता ॥3॥ 4139 िस्थरावली वृित्त पांगुळला प्राण । अंतरींची खुण पावूनियां ॥1॥ पुंजाळले नेत्र जाले अधाौन्मीिळत । कंठ सद्गदित रोमांच आले ॥ध्रु.॥ चित्त चाकाटलें स्वरूपा माझारी । न निघे बाहेरी सुखावलों ॥2॥ सुनीळ प्रकाश उदैजला दिन । अमृताचें पान जीवनकळा ॥3॥ शशिसूर्या जाली जीवें ओंवाळणी । आनंदा दाटली आनंदाची ॥4॥ तुका ह्मणे सुखें प्रेमासी डुलत । वीरालों नििंश्चत नििंश्चतीनें ॥5॥ 4140 बोध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ॥1॥ लोकांचियेसाटीं शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ॥ध्रु.॥ आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ॥2॥ म्यां च तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका ह्मणे ॥3॥ 4141 मुखीं विठ्ठलाचें नाम । मग कैचा भवभ्रम ॥1॥ चालतां बोलतां खातां । जेवितां निद्रा करितां ॥ध्रु.॥ सुखें असों संसारीं । मग जवळी च हरि ॥2॥ मुिHवरील भिH जाण । अखंड मुखीं नारायण ॥3॥ मग देवभH जाला । तुका तुकीं उतरला ॥4॥ 4142 प्रेम जडलें तुझे पायीं । आणीक न सुचे मजला कांहीं ॥1॥ रात्रीदिवस तुझें ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ नामापरतें नेणें दुजें । ऐसें कळलें मजला निज ॥2॥ तुका ह्मणे अंतकाळीं । आह्मां सोडवीं तात्काळीं ॥3॥ 4143 तुझे पाय माझी काशी । कोण जाय माझें काशी॥1॥ तुझें रूप तें चि ध्यान । तें चि माझें अनुष्ठान ॥ध्रु.॥ तुझे चरण ते चि गया । जालें गयावर्जन देहा ॥2॥ तुका ह्मणे सकळ तीथॉ । तुझें पायीं वसती येथें ॥3॥ 4144 क्षुधा तृषा कांहीं सर्वथा नावडे । पहावया धांवें कोल्हांटासी ॥1॥ कथेसी साक्षेपें पाचारिला जरी । ह्मणे माझ्या घरीं कोणी नाहीं ॥ध्रु.॥ बलत्कारीं जरी आणिला कथेसी । निद्रा घे लोडेंसी टेंकूनियां ॥2॥ तुका ह्मणे थुंका त्याच्या तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥3॥ 4145 श्रीराम सखा ऐसा धरीं भाव । मीपणाचा ठाव पुसीं मना ॥1॥ शरण निरंतर ह्मण तूं गोविंदा । वाचे लावीं धंदा नारायण ॥ध्रु.॥ यापरि सोपान नाहीं रे साधन । वाहातसें आण तुझी मना ॥2॥ नको कांहीं करूं अळस अंतरीं । जपें निरंतर रघुपती ॥3॥ तुका ह्मणे मोठा लाभ नरदेहीं । देहीं च विदेही होती नामें ॥4॥ 4146 सर्वापरी तुझे गुण गाऊं उत्तम । तुझेठायीं प्रेम राहो माझें ॥1॥ माउलीपरिस आहेसी उदार । तरि कां निष्ठ‍ मन केलें॥ध्रु.॥ गजेंद्राकारणें केलें त्वां धांवणें । तरि कां निर्वाण पाहातोसी॥2॥ प्रल्हादास कष्टीं रिक्षलें तों देवा । तरि कां केशवा सांडी केली ॥3॥ अन्यायी अजामेळ तो जाला पावन । ऐसें हें पुराण हाका मारी ॥4॥ तुका ह्मणे माझे थोर अपराध । नाम करी छेद क्षणमात्रें ॥5॥ 4147 आतां वांटों नेदीं आपुलें हें मन । न सोडीं चरण विठोबाचे ॥1॥ दुजियाचा संग लागों नेदीं वारा । आपुल्या शरीरावरूनियां ॥ध्रु.॥ यावें जावें आह्मीं देवा च सांगातें । मागूनी करीत हें चि आलों ॥2॥ काय वांयां गेलों तो करूं उद्वेग । उभा पांडुरंग मागें पुढें ॥3॥ तुका ह्मणे प्रेम मागतों आगळें । येथें भोगूं फळें वैकुंठींचीं ॥4॥ 4148 आतां आह्मां हें चि काम । वाचे स्मरूं रामराम ॥1॥ ऐसी मोलाची हे घडी । धरूं पायांची आवडी ॥ध्रु.॥ अमृताची खाणी । तये ठायीं वेचूं वाणी ॥2॥ तुका ह्मणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ॥3॥ 4149 आतां जावें पंढरीसी । दंडवत विठोबासी ॥1॥ जेथें चंद्रभागातिरीं । आह्मी नाचों पंढरपुरीं ॥ध्रु.॥ जेथें संतांची दाटणी । त्याचें घेऊं पायवणी ॥2॥ तुका ह्मणे आह्मी बळी । जीव दिधला पायां तळीं ॥3॥ 4150 आह्मी नरका जातां काय येइल तुझ्या हाता । ऐसा तूं अनंता विचारीं पां ॥1॥ तुज शरण आलियाचें काय हें चि फळ। विचारा दयाळ कृपानिधी ॥ध्रु.॥ तुझें पावनपण न चले आह्मांसीं । ऐसें हृषीकेशी कळों आलें ॥2॥ आह्मी दुःख पावों जन्ममरण वेथा । काय तुझ्या हाता येत असे ॥3॥ तुका ह्मणे तुह्मी खादली हो रडी । आह्मी धरली सेंडी नाम तुझें ॥4॥ 4151 पांडुरंगे पाहा खादलीसे रडी । परिणाम सेंडी धरिली आह्मी ॥1॥ आतां संतांनीं करावी पंचाइऩत । कोण हा फजितखोर येथें ॥ध्रु.॥ कोणाचा अन्याय येथें आहे स्वामी । गर्जतसों आह्मी पातकी ही ॥2॥ याचें पावनपण सोडवा चि तुह्मी । पतितपावन आह्मी आहों खरें ॥3॥ आह्मी तंव आहों अन्यायी सर्वथा । याची पावन कथा कैसी आहे ॥4॥ तुका ह्मणे आह्मी मेलों तरी जाणा । परि तुमच्या चरणा न सोडावें ॥5॥ 4152 घालूनियां मध्यावर्ती । दाटुनि उपदेश देती ॥1॥ ऐसे पोटभरे संत । तयां कैंचा भगवंत ॥ध्रु.॥ रांडापोरांतें गोविती । वर्षासन ते लाविती ॥2॥ जसे बोलती निरोपणीं । तैसी न करिती करणी ॥3॥ तुका ह्मणे तया । तमोगुणियाची क्रिया ॥4॥ 4153 वैभव राज्य संपत्ती टाकावी । उदरार्थ मागावी माधोकरी॥1॥ आपुलें तें आधीं करावें स्वहित । ऐसी आहे नीत स्वधर्माची ॥ध्रु.॥ वर्ण कुळ जाति याचा अभिमान । तजावा सन्मान लौकिकाचा ॥2॥ तुका ह्मणे राहे एकाकी निःशंक । देउनियां हाक कंठीं काळ ॥3॥ 4154 हातपाय मिळोनि मेळा । चला ह्मणती पाहों डोळां॥1॥ देखणी नव्हे देखती कैसे । सकळांचा देखणा डोळा चि असे ॥2॥ डोऑयाचा डोळा पाहों गेला । तुका ह्मणे तो पाहों ठेला ॥3॥ 4155 मुखें संति इंिद्रयें जती । आणिक नेणे भाव भHी॥1॥ देवा हे चि दोन्ही पदें । येर गाइलीं विनोदें ॥2॥ चित्ताचें आसन। तुका करितो कीर्त्तन ॥3॥ 4156 धांवोनियां आलों पहावया मुख । गेलें माझें दुःख जन्मांतरिंचें ॥1॥ ऐकिलें ही होतें तैसें चि पाहिलें । मन िस्थरावलें तुझ्या पायीं ॥2॥ तुका ह्मणे माझी इच्छा पूर्ण जाली । कांहीं न राहिली वासना हे ॥3॥ 4157 गावलोकिकाहीं लावियेलें पिसें । काय सांगों ऐसें तुजपासीं ॥1॥ तोंड काळें केलें फिरविलें मज । नाहीं धरिली लाज पांडुरंगा ॥ध्रु.॥ काय तुजपासीं सांगों हें गा†हाणें । मग काय जिणें तुझें माझें ॥2॥ कोणासाटीं आतां करावा संसार । केली वारावार आपणें चि ॥3॥ तुका ह्मणे आह्मी मोडिला घरचार । धरियेला धीर तुझ्या पायीं ॥4॥ 4158 जीवें जीव नेणे पापी सारिका चि । नळी दुजयाची कापूं बैसे ॥1॥ आत्मा नारायण सर्वां घटीं आहे । पशुमध्यें काय कळों नये ॥ध्रु.॥ देखत हा जीव हुंबरे वरडत । निष्ठ‍ाचे हात वाहाती कैसे ॥2॥ तुका ह्मणे तया चांडाळासी नर्क । भोगिती अनेक महादुःखें ॥3॥ 4159 मनीं भाव असे कांहीं । तेथें देव येती पाहीं ॥1॥ पाहा जनाइऩ सुंदरी । तेथें देव पाणी भरी ॥ध्रु.॥ शुद्ध पाहोनियां भाव । त्याचे हृदयीं वसे देव ॥2॥ तुका ह्मणे विठोबासी । ठाव देइप चरणापासीं ॥3॥ 4160 भागल्याचें तारूं शिणल्याची साउली । भुकेलिया घाली प्रेमपान्हा ॥1॥ ऐसी हे कृपाळू अनाथांची वेशी । सुखाची च राशी पांडुरंग ॥ध्रु.॥ सकळां सन्मुख कृपेचिया दृष्टी । पाहे बहु भेटी उतावीळां ॥2॥ तुका ह्मणे येथें आतां उरला कैंचा । अनंता जन्मींचा शीण भाग ॥3॥ 4161 काय न्यून आहे सांगा । पांडुरंगा तुह्मांपें ॥1॥ आमुची तों न पुरे इच्छा । पिता ऐसा मस्तकीं ॥ध्रु.॥ कैसी तुह्मां होय सांडी । करुणा तोंडीं उच्चारें ॥2॥ आश्चर्य चि करी तुका । हे नायका वैकुंठिंचिया ॥3॥ 4162 चित्त गुंतलें प्रपंचें । जालें वेडें ममतेचें ॥1॥ आतां सोडवीं पांडुरंगा । आलें निवारीं तें आंगा ॥ध्रु.॥ गुंतली चावटी । नामीं रूपीं जाली तुटी ॥2॥ तुका ह्मणे चाली । पुढें वाट खोळंबली॥3॥ 4163 किती एका दिसीं । बुिद्ध जाली होती ऐसी ॥1॥ कांहीं करावें स्वहित । तों हें न घडे उचित ॥ध्रु.॥ अवलंबुनी भीक। लाज सांडिली लौकिक ॥2॥ तुका ह्मणे दीन । जालों मनुष्यपणा हीन ॥3॥ 4164 आतां बरें जालें । सकाळीं च कळों आलें ॥1॥ मज न ठेवीं इहलोकीं । आलों तेव्हां जाली चुकी ॥ध्रु.॥ युगमहिमा ठावा । नव्हता ऐसा पुढें देवा ॥2॥ तुका ह्मणे ठेवीं । भोगासाटीं निरयगांवीं ॥3॥ 4165 परि आतां माझी परिसावी विनंती । रखुमाइऩच्या पती पांडुरंगा ॥1॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥2॥ तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥3॥ 4166 पापाचिया मुळें । जालें सत्याचें वाटोळें ॥1॥ दोष जाले बिळवंत । नाहीं ऐसी जाली नीत ॥ध्रु.॥ मेघ पडों भीती । पिकें सांडियेली िक्षती ॥2॥ तुका ह्मणे कांहीं । वेदा वीर्य शिH नाहीं॥3॥ 4167 ऐसा दुस्तर भवसागर । नेणों कैसा उतरूं पार ॥1॥ कामक्रोधादि सावजें थोर । दिसताती भयंकर ॥ध्रु.॥ मायाममतेचे भोवरे । घेती भयानक फेरे ॥2॥ वासनेच्या लहरा येती । उद्योगहेलकावे बसती ॥3॥ तरावया एक युिH असे । तुका नामनावेमधीं बैसे॥4॥ 4168 देव जडला जाइना अंगा । यासी काय करूं सांगा॥1॥ वरकड देव येती जाती । हा देव जन्माचा सांगाती ॥ध्रु.॥ अंगीं भरलें देवाचें वारें । देव जग चि दिसे सारें ॥2॥ भूत न बोले निरुतें। कांहीं केल्या न सुटे तें ॥3॥ जीव खादला दैवतें । माझा आणि पंचभूतें ॥4॥ तुका ह्मणे वाडें कोडें । उभें पुंडलिकापुढें॥5॥ 4169 हरिदासाचिये घरीं । मज उपजवा जन्मांतरीं ॥1॥ ह्मणसी कांहीं मागा । हें चि देगा पांडुरंगा ॥ध्रु.॥ संतां लोटांगणीं । जातां लाजों नको मनीं ॥2॥ तुका ह्मणे अंगीं । शHी देइप नाचें रंगीं ॥3॥ 4170 लटिक्याचें आंवतणें जेविलिया साच । काय त्या विश्वास तो चि खरा ॥1॥ कोल्हांटिणी लागे आकाशीं खेळत । ते काय पावत अमरपद ॥ध्रु.॥ जळमंडपयाचे घोडे राउत नाचती । ते काय तडवती युद्धालागीं ॥2॥ तुका ह्मणे तैसें मतवादीयांचें जिणें। दिसे लाजिरवाणें बोलतां चि ॥3॥ 4171 काय आह्मीं केलें ऐसें । नुद्धरीजेसें सांगावें ॥1॥ हरण कोल्हें वैकुंठवासी । कोण त्यासी अधिकार ॥ध्रु.॥ गजा नाडएा सरोवरीं । नाहीं हरी विचारिलें ॥2॥ तुका ह्मणे गणिका नष्ट। माझे कष्ट त्याहूनि ॥3॥ 4172 भाग्यासाटीं गुरु केला । नाहीं आह्मांसी फळला॥1॥ याचा मंत्र पडतां कानीं । आमच्या पेवांत गेलें पाणी ॥ध्रु.॥ गुरु केला घरवासी । आमच्या चुकल्या गाइऩम्हसी ॥2॥ स्वामी आपुली बुटबुट घ्यावी । आमुची प्रताप टाकुन द्यावी ॥3॥ तुका ह्मणे ऐसे नष्ट । त्यांसी दुणे होती कष्ट ॥4॥ 4173 गुणा आला इऩटेवरी । पीतांबरधारी सुंदर जो ॥1॥ डोळे कान त्याच्या ठायीं । मन पायीं राहो हें ॥ध्रु.॥ निवारोनी जाय माया । ऐसी छाया जयासी ॥2॥ तुका ह्मणे समध्यान । हे चरण सकुमार ॥3॥ 4174 रंगीं रंगें नारायण । उभा करितों कीर्त्तन ॥1॥ हातीं घेउनियां वीणा । कंठीं राहें नारायणा ॥ध्रु.॥ देखिलीसे मूर्ती । माझ्या हृदयाची विश्रांति ॥2॥ तुका ह्मणे देवा । देइप कीर्त्तनाचा हेवा ॥3॥ 4175 तुझा भरवसा आम्हां । फार होता पुरुषोत्तमा ॥1॥ भवसागरसंकटीं । तारिशील जगजेठी ॥ध्रु.॥ नाम आदित्याचें झाड। त्याचा न पडे उजड ॥2॥ सिलंगणीचें सोनें । त्यासीं गाहाण ठेवी कोण ॥3॥ तुका ह्मणे देवा । िब्रद सोडूनियां ठेवा ॥4॥ 4176 जालों आतां दास । माझी पुरवीं हे आस ॥1॥ पंढरीचा वारकरी । वारी चुकों नेदीं हरी ॥ध्रु.॥ संतसमागम । अंगीं भरोनियां प्रेम ॥2॥ चंद्रभागे स्नान । तुका ह्मणे हें चि दान ॥3॥ 4177 यासाटीं करितों निष्ठ‍ भाषण । आहेसी तूं जाण सर्वदाता ॥1॥ ऐसें दुःख कोण आहे निवारिता । तें मी जाऊं आतां शरण त्यासी ॥ध्रु.॥ बैसलासे केणें करुनि एक घरीं । नाहीं येथें उरी दुस†याची ॥2॥ तुका ह्मणे आलें अवघें पायांपें । आतां मायबापें नुपेक्षावें ॥3॥ 4178 पोरा लागलीसे चट । धरी वाट देवळाची ॥1॥ सांगितलें नेघे कानीं । दुजें मनी विठ्ठल ॥ध्रु.॥ काम घरीं न करी धंदा । येथें सदा दुिश्चत्त ॥2॥ आमुचे कुळीं नव्हतें ऐसें । हें चि पिसें निवडलें ॥3॥ लौकिकाची नाहीं लाज । माझें मज पारिखें॥4॥ तुका ह्मणे नरका जाणें । त्या वचनें दुष्टाचीं ॥5॥ 4179 देवा बोलें आतां बोला । त्वां कां धरिला अबोला॥1॥ भेऊं नको देइप भेटी । तूं कां पडिलासी संकटीं ॥ध्रु.॥ तुझ्या जीवींचें मी जाणें । ह्मणसी मुHी आह्मां देणें ॥2॥ तुका ह्मणे न लगे कांहीं । चित्त राहो तुझे पायीं ॥3॥ 4180 यमधर्म आणिक ब्रह्मादिक देव । त्यांचा पूर्ण भाव तुझे पायीं ॥1॥ करिती स्मरण पार्वतीशंकर । तेथें मी किंकर कोणीकडे॥ध्रु.॥ सहजरमुखेंसी घोष फणिवराचा । मज किंकराचा पाड काय ॥2॥ चंद्र सूर्य आणि सर्व तारांगणें । करिती भ्रमण प्रदिक्षणा ॥3॥ तुका ह्मणे त्यांसी स्वरूप कळेना । तेथें मज दीना कोण पुसे ॥4॥ 4181 विठोबाचे पायीं जीव म्यां ठेविला । भिHभावें केला देव ॠणी ॥1॥ देव माझा ॠणी आहे सहाकारी । परसपरवारि भवभय ॥ध्रु.॥ भवभयडोहीं बुडों नेदी पाहीं । धरूनियां बाही तारी मज ॥2॥ तारियेले दास पडिल्या संकटीं । विष केलें पोटीं अमृतमय ॥3॥ अमृतातें सेवीतसे नामरसा । तोडियेला फांसा बंधनाचा ॥4॥ बंधनाचा फांसा आह्मीं कांहीं नेणों । पाय तुझे जाणों पद्मनाभा ॥5॥ पद्मनाभा नाभिकमळीं ब्रह्मादिक । त्रैलोक्यनायक ह्मणविसी ॥6॥ ह्मणविसी देवा दासाचा अंकित । मनाचा संकेत पाहोनियां ॥7॥ पाहोनियां दृढ निश्चय तयाचा । तो चि दास साचा जवळीक ॥8॥ जवळीक जाली ब्रह्मीं सुखावले । मार्ग दाखविले मूढा जना ॥9॥ मूढा जनामाजी दास तुझा मूढ । कास तुझी दृढ धरियेली ॥10॥ धरियेले तुझे पाय रे विठ्ठला । तुका सुखी जाला तुझ्या नामें ॥11॥ 4182 बहु क्लेशी जालों या हो नरदेहीं । कृपादृष्टी पाहीं पांडुरंगा ॥1॥ पांडुरंगा सर्वदेवांचिया देवा । घ्यावी माझी सेवा दिनानाथा ॥ध्रु.॥ दिनानाथ िब्रद त्रिभुवनीं तुझें । मायबापा ओझें उतरावें ॥2॥ उतरीं सत्वर पैलथडी नेइप । पूर्णसुख देइप पायांपाशीं॥3॥ पायांपाशीं मज ठेवीं निरंतर । आशा तुझी फार दिवस केली ॥4॥ केली आस तुझी वाट मी पाहातों । निशिदिनीं ध्यातों नाम तुझें॥5॥ नाम तुझें गोड स्वभHा आवडे । भHांलागीं कडे खांदा घेसी॥6॥ घेसी खांद्यावरी खेळविसी लोभें । पाउल शोभे विटेवरि ॥7॥ विटेवरि उभा देखिलासी डोळां । मनाचा सोहळा पुरविसी ॥8॥ पुरवीं सत्वर त्रैलोक्यस्वामिया । मिठी घाली पायां तुका भावें ॥9॥ 4183 एक वेळे तरी जाइऩन माहेरा । बहुजन्म फेरा जाल्यावरी॥1॥ चित्ता हे बैसली अविट आवडी । पालट ती घडी नेघे एकी ॥ध्रु.॥ करावें ते करी कारणशरीर । अंतरीं त्या धीर जीवनाचा ॥2॥ तुका ह्मणे तरि होइल विलंब । परि माझा लाभ खरा जाला ॥3॥ 4184 सांग त्वां कोणासी तारिलें । संतांवेगळें उद्धरिलें॥1॥ संत शब्द उपदेशी । मग तूं हो ह्मणशी ॥2॥ तुका ह्मणे नाहीं तुझा उपकार । करूं संतांचा उच्चार ॥3॥ 4185 उमा रमा एके सरी । वाराणसी ते पंढरी ॥1॥ दोघे सारिखे सारिखे । विश्वनाथ विठ्ठल सखे ॥ध्रु.॥ तेथें असे भागीरथी। येथें जाणा भीमरथी ॥2॥ वाराणशी त्रिशुलावरी । सुदर्शनावरि पंढरी ॥3॥ मनकणिऩका मनोहर । चंद्रभागा सरोवर ॥4॥ वाराणशी भैरवकाळ । पुंडलीक क्षेत्रपाळ ॥5॥ धुंडिराज दंडपाणी। उभा गरुड कर जोडुनी ॥6॥ गया ते चि गोपाळपुर । प्रयाग निरानरसिंपुर ॥7॥ तेथें असती गयावळ । येथें गाइऩ आणि गोपाळ॥8॥ शमीपत्रपिंड देती । येथें काला निजसुखप्रािप्त ॥9॥ संतसज्जनीं केला काला । तुका प्रसाद लाधला ॥10॥ 4186 फटएाचे बडबडे चवी ना संवाद । आपुला चि वाद आपणासी ॥1॥ कोणें या शब्दाचे मरावें घाणी । अंतरें शाहाणी राहिजे हो ॥ध्रु.॥ गाढवाचा भुंक आइकतां कानीं । काय कोडवाणी ऐसियेचें ॥2॥ तुका ह्मणे ज्यासी करावें वचन । त्याचे येती गुण अंगास ते ॥3॥ 4187 दिवसा व्यापारचावटी । रात्री कुटुंबचिंता मोटी ॥1॥ काय करूं या मनासी । नाठवे हृषीकेशी ॥ध्रु.॥ वेश्येपाशीं रात्रीं जागे । हरिकीर्त्तनीं निद्रा लागे ॥2॥ तुका ह्मणे काय जालासी । वृथा संसारा आलासी ॥3॥ 4188 अहो कृपावंता । हाइप बुद्धीचा ये दाता ॥1॥ जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥ वदवी हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥2॥ तुका ह्मणे देवा । माझें अंतर वसवा ॥3॥ 4189 निंदक तो परउपकारी । काय वणूप त्याची थोरी । जे रजकाहुनि भले परि । सर्व गुणें आगळा ॥1॥ नेघे मोल धुतो फुका। पाप वरच्यावरि देखा । करी साधका । शुद्ध सरते तिहीं लोकीं ॥ध्रु.॥ मुखसंवदणी सांगते । अवघें सांटविलें तेथें । जिव्हा साबण निरुतें । दोष काढी जन्माचे ॥2॥ तया ठाव यमपुरीं । वास करणें अघोरीं । त्यासी दंडण करी । तुका ह्मणे न्हाणी ते ॥3॥ 4190 प्रपंचाची पीडा सोसिती अघोरी । जया क्षणभरी नाम नये ॥1॥ नाम नाठविती आत्मया रामाचें । धिग जिणें त्याचें भवा मूळ ॥ध्रु.॥ मूळ ते पापाचें आचरण तयाचें । नाहीं राघवाचें स्मरण त्या ॥2॥ स्मरण भजन नावडे जयासी । आंदणीया दासी यमदूतां॥3॥ चिंतन रामाचें न करी तो दोषी । एकांत तयासीं बोलों नये ॥4॥ नये त्याचा संग धरूं ह्मणे तुका । धरितां पातका वांटेकरी ॥5॥ 4191 अथॉविण पाठांतर कासया करावें । व्यर्थ चि मरावें घोकूनियां ॥1॥ घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनियां ॥2॥ तुका ह्मणे ज्याला अथाअ आहे भेटी । नाहीं तरी गोष्टी बोलों नका ॥3॥ 4192 बसतां चोरापाशीं तैसी होय बुिद्ध । देखतां चि चिंधी मन धांवे ॥1॥ व्यभिचा†यापासीं बैसतां क्षणभरी । देखतां चि नारी मन धांवे ॥ध्रु.॥ प्रपंचाचा छंद टाकूनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥2॥ सांडुनियां देइप संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥23॥ तुका ह्मणे तुला सांगतों मी एक । रुिक्मणीनायक मुखीं गावा ॥4॥ 4193 मस्तकीं सहावें ठांकियासी जाण । तेव्हां देवपण भोगावें गा ॥1॥ आपुलिये स्तुती निंदा अथवा मान । टाकावा थुंकोन पैलीकडे ॥ध्रु.॥ सद्ग‍ुसेवन तें चि अमृतपान । करुनी प्राशन बैसावें गा ॥2॥ आपुल्या मस्तकीं पडोत डोंगर । सुखाचें माहेर टाकुं नये ॥3॥ तुका ह्मणे आतां सांगूं तुला किती । जिण्याची फजीती करूं नये ॥4॥ 4194 स्वामिसेवा गोड । माते बाळकाचें कोड ॥1॥ जेंजें मागावें भातुकें । तेंतें पुरवी कौतुकें ॥ध्रु.॥ खेळविलें कोडें । हरुषें बोले कीं बोबडें ॥2॥ तुका ह्मणे लाड । तेथें पुरे माझें कोड ॥3॥ 4195 तुझें नाम पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥1॥ दाहां नये विसां नये । पंनासां साटां नये ॥ध्रु.॥ शां नये सहस्रा नये। लक्षकोडीलागीं नये ॥2॥ तुका ह्मणे पंढरिनाथा । भावेंविण नये हाता ॥3॥ 4196 संतांपायीं विन्मुख जाला । तो जरि संगति मागों आला ॥1॥ तरि त्याहुनि दुरी जावें । सुखें एकांतीं बैसावें ॥ध्रु.॥ आत्मचर्चा नाहीं जेथें । अगी लावुनि द्यावी तेथें ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । चित्ता समाधान कांहीं ॥3॥ 4197 हिरा ठेवितां काळें गाहाण । मोल न तुटे दुकाळीं जाण ॥1॥ तैसे संतजन पाहीं । विनटले श्रीहरिपायीं ॥2॥ तुका ह्मणे तैसे भH । तयांसी जन हें निंदित ॥3॥ 4198 परिसें गे सुनेबाइऩ । नको वेचूं दूध दहीं ॥1॥ आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ॥ध्रु.॥ ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटकें पाळें ॥2॥ माझे हातींचा कलवडू । मजवाचुंनि नको फोडूं ॥3॥ वळवटिक्षरीचें लिंपन । नको फोडूं मजवांचून ॥4॥ उखळ मुसळ जातें । माझें मन गुंतलें तेथें ॥5॥ भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ॥6॥ भक्षीं मपित आहारु । नको फारसी वरो सारूं ॥7॥ सून ह्मणे बहुत निकें । तुह्मी यात्रेसि जावें सुखें ॥8॥ सासूबाइऩ स्वहित जोडा । सर्व मागील आशा सोडा ॥9॥ सुनमुखीचें वचन कानीं । ऐकोनि सासू विवंची मनीं ॥10॥ सवतीचे चाळे खोटे । म्यां जावेंसें इला वाटे॥11॥ अतां कासया यात्रे जाऊं । काय जाउनि तेथें पाहूं॥12॥ मुलें लेंकरें घर दार । माझें येथें चि पंढरपूर ॥13॥ तुका ह्मणे ऐसें जन । गोवियेलें मायेंकरून ॥14॥ 4199 एक ते गाढव मनुष्याचे वेष । हालविती पुस पुढें दाढी ॥1॥ निंदा हें भोजन जेवण तयांसी । जोडी घरीं रासी पातकांच्या ॥2॥ तुका ह्मणे सुखें बैसोनियां खाती । कुंभपाकीं होती नर्कवासी ॥3॥ 4200 मागत्याची टाळाटाळी । झिंझ्या वोढूनि कपाळीं॥1॥ ऐसा तंव मोळा । तुमचा नसेल गोपाळा ॥ध्रु.॥ नसेल ना नवें । ऐसें धरियेलें देवें ॥2॥ तुका ह्मणे जाला । उशीर नाहीं तो विठ्ठला॥3॥ [[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]] niydzidifhx70z6lz7ha3ruu6zpgf0k तुकाराम गाथा/ ४२०१ ते ४५८३ 0 1547 36915 36887 2026-09-19T19:44:40Z QueerEcofeminist 1879 Restored revision 5025 by [[Special:Contributions/Rahuldeshmukh101|Rahuldeshmukh101]] ([[en:w:User:BrandonXLF/Restorer|Restorer]]) 36915 wikitext text/x-wiki 4201 संसार करिती मोठएा महत्वानें । दिसे लोका उणें न कळे त्या ॥1॥ पवित्रपण आपुलें घरच्यासी च दिसे । बाहेर उदास निंदिताती ॥ध्रु.॥ आपणा कळेना आपले अवगुण । पुढिलाचे दोषगुण वाखाणिती ॥2॥ विषयाचे ध्यासें जग बांधियेलें । ह्मणोनि लागले जन्ममृत्यु ॥3॥ तुका ह्मणे माझें संचित चि असें । देवाजीचें पिसे सहजगुण ॥4॥ 4202 गव्हाराचें Yाान अवघा रजोगुण । सुखवासी होऊन विषय भोगी ॥1॥ त्यासी Yाानउपदेश केला । संगेंविण त्याला राहावेना ॥2॥ तुका ह्मणे संग उत्तम असावा । याविण उपावा काय सांगों ॥3॥ 4203 भाग्यालागी लांचावले । देवधर्म ते राहिले ॥1॥ कथे जातां अळसे मन । प्रपंचाचें मोटें Yाान ॥ध्रु.॥ अखंडप्रीति जाया । नेणे भजनाच्या ठाया ॥2॥ कथाकीर्त्तन धनाचें । सर्वकाळ विषयीं नाचे ॥3॥ तुका ह्मणे पंढरिराया । ऐसे जन्मविले वांयां॥4॥ 4204 पतिव्रतेची कीर्ती वाखाणितां । सिंदळइऩच्या माथां तिडिक उठे ॥2॥ आमुचें तें आहे सहज बोलणें । नाहीं विचारून केलें कोणीं ॥ध्रु.॥ अंगें उणें त्याच्या बैसे टाळक्यांत । तेणें ठिणग्या बहुत गाळीतसे ॥2॥ तुका ह्मणे आह्मी काय करणें त्यासी । ढका खवंदासी लागतसे ॥3॥ 4205 आहे ऐसा देव वदवावी वाणी । नाहीं ऐसा मनीं अनुभवावा ॥1॥ आवडी आवडी किळवराकिळवरी । वरिली अंतरी ताळी पडे ॥ध्रु.॥ अपूर्व दर्शन मातेपुत्रा भेटी । रडूं मागे तुटी हर्षयोगें ॥2॥ तुका ह्मणे एकें कळतें दुसरें । बरियानें बरें आहाचाचें आहाच ॥3॥ 4206 हे चि माझे चित्तीं । राहो भावप्रीति । विठ्ठल सुषुप्ती। जागृति स्वप्नासी ॥1॥ आणिक नाहीं तुज मागणें । राज्यचाड संपित्त धन । जिव्हे सुख तेणें । घेतां देहीं नाम तुझें॥ध्रु॥ तुझें रूप सर्वाठायीं । देखें ऐसें प्रेम देइप । न ठेवावा ठायीं । अनुभव चित्ताचा ॥2॥ जन्ममरणाचा बाध । समुळूनि तुटे कंद । लागो हा चि छंद। हरि गोविंद वाचेसी ॥3॥ काय पालटे दरुषणें । अवघें कोंदाटे चैतन्य । जीवशिवा खंडण । होय ते रे चिंतितां ॥4॥ तुका ह्मणे या चि भावें । आह्मीं धालों तुझ्या नामें । सुखें होत जन्म । भलते याती भलतैसीं ॥5॥ 4207 मौन कां धरिलें विश्वाच्या जीवना । उत्तर वचना देइप माझ्या ॥1॥ तूं माझें संचित तूं चि पूर्वपुण्य । तूं माझें प्राचीन पांडुरंगा ॥ध्रु.॥ तूं माझें सत्कर्म तूं माझा स्वधर्म । तूं चि नित्यनेम नारायणा ॥2॥ कृपावचनाची वाट पाहातसें । करुणा वोरसें बोल कांहीं ॥3॥ तुका ह्मणे प्रेमळाच्या िप्रयोत्तमा । बोल सवाौत्तमा मजसवें ॥4॥ 4208 काय करूं आतां धरुनियां भीड । निःशंक हें तोंड वाजविलें ॥1॥ नव्हे जगीं कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोनी नव्हे हित ॥ध्रु.॥ आलें तें उत्तर बोलें स्वामीसवें । धीट नीट जीवें होऊनियां ॥2॥ तुका ह्मणे मना समर्थासीं गांठी । घालावी हे मांडी थापटूनि ॥3॥ 4209 माझिया तो जीवें घेतला हा सोस । पाहें तुझी वास भेटावया ॥1॥ मातेविण बाळ न मनी आणिका । सर्वकाळ धोका स्तनपाना ॥ध्रु.॥ वोसंगा निघाल्या वांचूनि न राहे । त्याचें आर्त माय पुरवीते ॥2॥ तुका ह्मणे माते भHां तूं कृपाळ । गििळयेले जाळ वनांतरीं ॥3॥ 4210 ते काय पवाडे नाहीं म्यां ऐकिले । गोपाळ रिक्षले वनांतरीं ॥1॥ मावेचा वोणवा होऊनि राक्षस । लागला वनास चहूंकडे ॥ध्रु.॥ गगनासी ज्वाळा लागती तुंबळ । गोधनें गोपाळ वेडावलीं ॥2॥ तुका ह्मणे तेथें पळावया वाट । नाहीं वा निपट ऐसें जालें ॥3॥ 4211 धडकला अिग्न आह्या येती वरी । गोपाळ श्रीहरी विनविती ॥1॥ अरे कृष्णा काय विचार करावा । आला रे वोणवा जळों आतां ॥ध्रु.॥ अरे कृष्णा तुझें नाम बिळवंत । होय कृपावंत राख आतां ॥2॥ तुका ह्मणे अरे कृष्णा नारायणा । गोपाळ करुणा भाकितिले ॥3॥ 4212 अरे कृष्णा आह्मी तुझे निज गडी । नवनीत आवडी देत होतों ॥1॥ अरे कृष्णा आतां राखेंराखें कैसें तरीं । संकटाभीतरीं पडियेलों ॥ध्रु.॥ वरुषला इंद्र जेव्हां शिळाधारीं । गोवर्धन गिरी उचलिला ॥2॥ तुका ह्मणे तुझे पवाडे गोपाळ । वणिऩती सकळ नारायणा ॥3॥ 4213 अरे कृष्णा तुवां काळया नाथिला । दाढे रगडिला रिठासुर ॥1॥ अरे कृष्णा तुवां पुतना शोषिली । दुर्बुिद्ध कळली अंतरींची ॥ध्रु.॥ गोपाळ करुणा ऐसी नानापरी । भाकिती श्रीहरी तुजपुढें ॥2॥ तुझें नाम कामधेनु करुणेची । तुका ह्मणे त्यांची आली कृपा ॥3॥ 4214 चहुंकडूनियां येती ते कलोळ । सभोंवते जाळ जविळ आले ॥1॥ सकुमार मूतिऩ श्रीकृष्ण धाकुटी । घोंगडी आणि काठी खांद्यावरि ॥ध्रु.॥ लहान लेंकरूं होत ते सगुण । विक्राळ वदन पसरिलें ॥2॥ चाभाड तें एक गगनीं लागलें । एक तें ठेविलें भूमीवरि ॥3॥ तये वेळे अवघे गोपाळ ही भ्याले । तुकें ही लपालें भेऊनियां ॥4॥ 4215 श्रीमुख वोणवा गिळीत चालिलें । भ्यासुर वासिलें वदनांबुज ॥1॥ विक्राळ त्या दाढा भ्यानें पाहावेना । धाउनी रसना ज्वाळ गिळी ॥ध्रु.॥ जिव्हा लांब धांवे गोळा करी ज्वाळ । मोटें मुखकमळ त्यांत घाली ॥ 2॥ तुका ह्मणे अवघा वोणवा गीिळला। आनंद जाहाला गोपाळांसी ॥3॥ 4216 गोपाळ प्रीतीनें कैसे विनविती । विक्राळ श्रीपती होऊं नको ॥1॥ नको रे बा कृष्णा धरूं ऐसें रूप । आह्मां चळकांप सुटलासे ॥ध्रु.॥ होइप बा धाकुटा शाम चतुर्भूज । बैसोनियां गुज सुखें बोलों ॥2॥ वोणव्याच्या रागें गििळशील आह्मां । तुका मेघशामा पायां लागे ॥3॥ 4217 सांडियेलें रूप विक्राळ भ्यासुर । झालें सकुमार कोडिसवाणें ॥1॥ शाम चतुर्भुज मुकुट कुंडलें । सुंदर दंडलें नव बाळ ॥ध्रु.॥ गोपाळ ह्मणती कैसें रे बा कृष्णा । रूप नारायणा धरियेलें ॥2॥ कैसा वाढलासी विक्राळ जालासी । गटगटा ज्वाळांसी गििळयेलें ॥3॥ तुका ह्मणे भावें पुसती गोपाळ । अनाथवत्सल ह्मणोनियां ॥4॥ 4218 बा रे कृष्णा तुझें मुख कीं कोमळ । कैसे येवढे ज्वाळ ग्रासियेले ॥1॥ बा रे कृष्णा तुझी जिव्हा कीं कोवळी । होइऩल पोिळली नारायणा ॥ध्रु.॥ बैसें कृष्णा तुझें पाहूं मुखकमळ । असेल पोळलें कोणे ठायीं ॥2॥ घोंगडिया घालीं घालूनियां तळीं। वरी वनमाळी बैसविती ॥3॥ तुका ह्मणे भावें आकिळला देव । कृपासिंधुराव त्रैलोक्याचा ॥4॥ 4219 एक ह्मणती मुख वासीं नारायणा । पाहों दे वदना डोळेभरि ॥1॥ वासुनियां मुख पहाती सकळ । अवघे गोपाळ व्योमाकार ॥ध्रु.॥ ह्मणती गोपाळ बेटे हो हा देव । स्वरूपाचा ठाव न कळे याच्या ॥2॥ तुका ह्मणे अवघे विठोबाभोंवते । मिळाले नेणते लहानथोर ॥3॥ 4220 एक ह्मणती कृष्णा वासिलें त्वां मुख । तेव्हां थोर धाक पडिला आह्मां ॥1॥ गिळों लागलासी अग्नीचे कल्लोळ । आह्मी चळचळां कांपतसों ॥ध्रु.॥ ज्वाळांबरोबरि गिळशील आह्मां। ऐसें मेघशामा भय वाटे ॥2॥ तुका ह्मणे ऐसे भाग्याचे गोपाळ । फुटकें कपाळ आमुचें चि ॥3॥ 4221 गोपाळांचें कैसें केलें समाधान । देउनि आलिंगन निवविले ॥1॥ ज्वाळाबरोबरि तुह्मां कां ग्रासीन । अवतार घेणें तुह्मांसाटीं ॥ध्रु.॥ निर्गुण निर्भय मी सर्वांनिराळा । प्रकृतिवेगळा गुणातीत ॥2॥ चिन्मय चिद्रूप अवघें चिदाकार । तुका ह्मणे पार नेणे ब्रह्मा ॥3॥ 4222 ऐसा मी अपार पार नाहीं अंत । परि कृपावंत भाविकांचा ॥1॥ दुर्जनां चांडाळां करीं निदाऩळण । करीं संरक्षण अंकितांचें ॥ध्रु.॥ भH माझे सखे जिवलग सांगाती । सर्वांग त्यांप्रति वोडवीन ॥2॥ पीतांबरछाया करीन त्यांवरी । सदा त्यांचे घरीं दारी उभा ॥3॥ माझे भH मज सदा जे रातले । त्यांघरीं घेतलें धरणें म्यां ॥4॥ कोठें हें वचन ठेविलें ये वेळे । तुका ह्मणे डोळे झांकियेले ॥5॥ 4223 भ्रतारेंसी भार्या बोले गुज गोष्टी । मज ऐसी कष्टी नाहीं दुजी ॥1॥ अखंड तुमचें धंद्यावरी मन । माझें तों हेळण करिती सर्व ॥ध्रु.॥ जोडितसां तुह्मी खाती हेरेंचोरें । माझीं तंव पोरें हळहळीती ॥2॥ तुमची व्याली माझे डाइप हो पेटली । सदा दुष्ट बोली सोसवेना ॥3॥ दुष्टव्रुति नंदुली सदा द्वेष करी । नांदों मी संसारीं कोण्या सुखें ॥4॥ भावा दीर कांहीं धड हा न बोले । नांदों कोणां खालें कैसी आतां ॥5॥ माझ्या अंगसंगें तुह्मांसी विश्रांति । मग धडगति नाहीं तुमची ॥6॥ ठाकतें उमकतें जीव मुठी धरूनि। परि तुह्मी अजूनि न धरा लाज ॥7॥ वेगळे निघतां संसार करीन । नाहीं तरी प्राण देतें आतां ॥8॥ तुका ह्मणे जाला कामाचा अंकित। सांगे मनोगत तैसा वर्ते ॥9॥ 4224 कामाचा अंकित कांतेतें प्राथिऩत । तूं कां हो दुिश्चत्त निरंतर ॥1॥ माझीं मायबापें बंधु हो बहिण । तुज करी सीण त्यागीन मी ॥ध्रु.॥ त्यांचें जरि तोंड पाहेन मागुता । तरि मज हत्या घडो तुझी ॥2॥ सकाळ उठोन वेगळा निघेन । वाहातों तुझी आण निश्चयेंसी ॥3॥ वेगळें निघतां घडीन दोरे चुडा । तूं तंव माझा जोडा जन्माचा कीं ॥4॥ ताइऩत सांकळी गळांचि दुलडी । बाजुबंदजोडी हातसर ॥5॥ वेणीचे जे नग सर्व ही करीन । नको धरूं सीण मनीं कांहीं ॥6॥ नेसावया साडी सेलारी चुनडी । अंगींची कांचोळी जािळया फुलें ॥7॥ तुका ह्मणे केला रांडेनें गाढव । मनासवें धांव घेतलीसे ॥8॥ 4225 उजिळतां उजळे दीपकाची वाती । स्वयंभ ते ज्योति हि†या अंगीं ॥1॥ एकीं महाकष्टें मेळविलें धन । एकासी जतन दैवयोगें ॥ध्रु.॥ परिमळें केलें चंदनाचे चिन्ह । निवडी ते भिन्न गाढव तो ॥2॥ तुका ह्मणे जया अंगीं हरिठसा । तो तरे सहसा वंद्य होय ॥3॥ 4226 बारावषॉ बाळपण । तें ही वेचलें अYाानें ॥1॥ ऐसा जन्म गेला वांयां । न भजतां पंढरिराया ॥ध्रु.॥ बाकी उरलीं आठएाशीं। तीस वेचलीं कामासी ॥2॥ बाकी उरलीं आठावन्न । तीस वेचली ममतेनें ॥3॥ बाकी उरलीं आठावीस । देहगेह विसरलास ॥4॥ तुका ह्मणे ऐसा झाडा । संसार हा आहे थोडा ॥5॥ 4227 सोवळा तो जाला । अंगीकार देवें केला ॥1॥ येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥ चुकला हा भार । तयाची च येरझार ॥2॥ तुका ह्मणे दास । जाला तया नाहीं नास॥3॥ 4228 आजि शिवला मांग । माझें विटाळलें आंग ॥1॥ यासी घेऊं प्रायिश्चत्त । विठ्ठलविठ्ठल हृदयांत ॥ध्रु.॥ जाली क्रोधासी भेटी । तोंडावाटे नर्क लोटी ॥2॥ अनुतापीं न्हाऊं । तुका ह्मणे रवी पाहूं ॥3॥ 4229 ठाव तुह्मांपाशीं । जाला आतां हृषीकेशी ॥1॥ न लगे जागावें सतत । येथें स्वभावें हे नीत ॥ध्रु.॥ चोरटएासी थारा। येथें कैंचा जी दातारा ॥2॥ तुका ह्मणे मनें । आह्मां जालें समाधान॥3॥ 4230 पािळयेले लळे । माझे विठ्ठले कृपाळे ॥1॥ बहुजन्माचें पोषणें । सरतें पायांपाशीं तेणें ॥ध्रु.॥ सवे दिली लागों । भातें आवडीचें मागों ॥2॥ तुका ह्मणे भिन्न । नाहीं दिसों दिलें क्षण॥3॥ 4231 जो या गेला पंढरपुरा । आणीक यात्रा न मानी तो॥1॥ सुलभ माय पंढरिराणा । पुरवी खुणा अंतरींच्या ॥ध्रु.॥ जन्मांतरिंच्या पुण्यरासी । वारी त्यासी पंढरी ॥2॥ बाहेर येतां प्राण फुटे । रडें दाटे गहिवरें ॥3॥ दधिमंगळभोजन सारा । ह्मणती करा मुरडींव ॥4॥ मागुता हा पाहों ठाव । पंढरिराव दर्शनें ॥5॥ तुका ह्मणे भूवैकुंठ । वाळुवंट भींवरा ॥6॥ 4232 न मिळती एका एक । जये नगरीचे लोक ॥1॥ भलीं तेथें राहूं नये । क्षणें होइऩल न कळे काय ॥ध्रु.॥ न करितां अन्याय । बळें करी अपाय ॥2॥ नाहीं पुराणाची प्रीति । ठायींठायीं पंचाइती ॥3॥ भल्या बु†या मारी । होतां कोणी न निवारी ॥4॥ अविचा†या हातीं । देऊनि प्रजा नागविती ॥5॥ तुका ह्मणे दरी । सुखें सेवावी ते बरी ॥6॥ 4233 शिकवणें नाक झाडी । पुढील जोडी कळेना ॥1॥ निरयगांवीं भोग देता । तेथें सत्ता आणिकांची ॥ध्रु.॥ अवगुणांचा सांटा करी । ते चि धरी जीवासी ॥2॥ तुका ह्मणे जडबुिद्ध । कर्मशुद्धी सांडवीं ॥3॥ 4234 गोपीचंदन मुद्रा धरणें । आह्मां लेणें वैष्णवां ॥1॥ मिरवूं अळंकार लेणें । हीं भूषणें स्वामीचीं ॥ध्रु.॥ विकलों ते सेवाजीवें । एक्या भावें एकविध ॥2॥ तुका ह्मणे शूर जालों । बाहेर आलों संसारा ॥3॥ 4235 विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥1॥ न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥ शिखासूत्र सोंग वरि । दुराचारी दंड पावे ॥2॥ तुका ह्मणे अभिमाना । नारायणा न सोसे॥3॥ 4236 वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥1॥ अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥ उभयकुल समवेत । नकाअ प्रवेश अद्भुत ॥2॥ तप्तलोहें भेटी । तुका ह्मणे कल्पकोटी ॥3॥ 4237 लटिकी ग्वाही सभेआंत । देतां पतित आगळा॥1॥ कुंभपाकीं वस्ती करूं । होय धुरु कुळेसी ॥ध्रु.॥ रजस्वला रुधिर स्रवे । तें चि घ्यावें तृषेसी ॥2॥ तुका ह्मणे जन्मा आला । काळ जाला कुळासी ॥3॥ 4238 आचरे दोष न धरी धाक । परीपाक दुःखाचा ॥1॥ चांडाळ तो दुराचारी । अंगीकारी कोण त्या ॥ध्रु.॥ नव्हे संतान वोस घर । अंधकार कुळासी ॥2॥ तुका ह्मणे त्याचें दान । घेतां पतन दुःखासी ॥3॥ 4239 कीविलवाणा जाला आतां । दोष करितां न विचारी॥1॥ अभिळाषी नारी धन । झकवी जन लटिकें चि ॥ध्रु.॥ विश्वासिया करी घात । न धरी चित्ता कांटाळा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं आला । वृथा गेला जन्मासी ॥3॥ 4240 घेऊं नये तैसें दान । ज्याचें धन अभिळाषी ॥1॥ तो ही येथें कामा नये । नकाऩ जाय ह्मणोनि ॥ध्रु.॥ विकी स्नानसंध्या जप । करी तप पुढिलांचें ॥2॥ तुका ह्मणे दांभिक तो । नकाऩ जातो स्वइच्छा ॥3॥ 4241 सदा नामघोष करूं हरिकथा । तेणें सदा चित्ता समाधान ॥1॥ सर्वसुख ल्यालों सर्व अलंकार । आनंदें निर्भर डुलतसों ॥ध्रु.॥ असों ऐसा कोठें आठव ही नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥2॥ तुका ह्मणे आह्मी जालों अिग्नरूप । लागों नेदूं पापपुण्य आतां ॥3॥ 4242 वरिवरि बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं जाली ॥1॥ पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥ मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे॥2॥ धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरिनामें ॥3॥ तुका ह्मणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतरें दुर्जनाचें ॥4॥ 4243 गंधर्वनगरीं क्षण एक राहावें । तें चि पैं करावें मुळक्षत्र ॥1॥ खपुष्पाची पूजा बांधोनि निर्गुणा । लIमीनारायणा तोषवावें ॥ध्रु.॥ वंध्यापुत्राचा लग्नाचा सोहळा । आपुलिया डोळां पाहों वेगीं ॥2॥ मृगजळा पोही घालुनि सYााना । तापलिया जना निववावें ॥3॥ तुका ह्मणे मिथ्या देहेंिद्रयकर्म । ब्रह्मार्पण ब्रह्म होय बापा ॥4॥ 4244 तुझा ह्मणविलों दास । केली उिच्छष्टासी आस॥1॥ मुखीं घालावा कवळ । जरी तूं होशील कृपाळ ॥2॥ सीण भाग माझा पुसें । तुका ह्मणे न करीं हांसें ॥3॥ 4245 काय मागें आह्मी गंुतलों काशानीं । पुढें वाहों मनीं धाक देवा ॥1॥ कीतिऩ चराचरीं आहे तैसी आहे । भेटोनियां काय घ्यावें आह्मां ॥ध्रु.॥ घेउनी धरणें बैसती उपवासी । हट आह्मांपासीं नाहीं तैसा ॥2॥ तातडी तयांनीं केली विटंबणा । आह्मां नारायणा काय उणें ॥3॥ नाहीं मुिHचाड वास वैकुंठींचा । जीव भाव आमुचा देऊं तुज ॥4॥ तुका ह्मणे काय मानेल तें आतां । तूं घेइप अनंता सर्व माझें ॥5॥ 4246 जालों बिळवंत । होऊनियां शरणागत ॥1॥ केला घरांत रिघावा । ठायीं पाडियेला ठेवा ॥ध्रु.॥ हाता चढे धन । ऐसें रचलें कारण ॥2॥ तुका ह्मणे मिठी । पायीं देउनि केली लुटी॥3॥ 4247 दासीचा जो संग करी । त्याचे पूर्वज नकाऩ द्वारीं॥1॥ ऐसे सांगों जातां जना । नये कोणाचिया मना ॥ध्रु.॥ बरें विचारूनी पाहें । तुज अंतीं कोण आहे ॥2॥ तुका ह्मणे रांडलेंका । अंतीं जासिल यमलोका ॥3॥ 4248 गुळ सांडुनि गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवि चाखावी ॥1॥ ऐसा प्रपंच सांडुनि घ्यावा । मग परमार्थ जोडावा॥ध्रु.॥ साकरेचा नव्हे ऊंस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥ बीज भाजुनि केली लाही । जन्ममरण आह्मांसि नाहीं ॥3॥ आकारासी कैंचा ठाव । देह प्रत्यक्ष जाला वाव ॥4॥ तुका ह्मणे अवघें जग । सर्वां घटीं पांडुरंग ॥5॥ 4249 आमुचें दंडवत पायांवरि डोइऩ । व्हावें उतराइऩ ठेवूनियां॥1॥ कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चित्त द्यावें बोला बोबडिया ॥2॥ तुका ह्मणे आह्मी लडिवाळें अनाथें । ह्मणोनि दिनानाथें सांभाळावें ॥3॥ 4250 भाग्यवंत आह्मी विष्णुदास जगीं । अभंग प्रसंगीं धैर्यवंत ॥1॥ नाही तें पुरवीत आणुनि जवळी । गाउनी माउली गीत सुखें ॥ध्रु.॥ प्रीति अंगीं असे सदा सर्वकाळ । वोळली सकळ सुखें ठायीं ॥2॥ आपुल्या स्वभावें जैसे जेथें असों । तैसे तेथें दिसों साजिरे चि ॥3॥ वासनेचा कंद उपडिलें मूळ । दुरितें सकळ निवारिलीं ॥4॥ तुका ह्मणे भHजनाची माउली । करील साउली विठ्ठल आह्मां ॥5॥ 4251 तीथॉ फळती काळें जन्में आगिळया । संतदृष्टी पाया हेळामात्रें ॥1॥ सुखाचे सुगम वैष्णवांचे पाय । अंतरींचा जाय महाभेव ॥ध्रु.॥ काळें हि न सरे तपें समाधान । कथे मूढजन समाधिस्थ ॥2॥ उपमा द्यावया सांगतां आणीक । नाहीं तिन्ही लोक धुंडािळतां ॥3॥ तुका ह्मणे मी राहिलों येणें सुखें । संतसंगें दुःखें नासावया ॥4॥ 4252 संतजना माझी यावया करुणा । ह्मणउनी दीन हीन जालों ॥1॥ नेणें योग युHी नाहीं Yाान मति । गातसें या गीती पांडुरंगा ॥ध्रु.॥ भाव भHी नेणें तप अनुष्ठान । करितों किर्त्तन विठ्ठलाचें ॥2॥ ब्रह्मYाान ध्यान न कळे धारणा । एका नारायणा वांचूनियां ॥3॥ तुका ह्मणे माझा विटोबासी भार । जाणे हा विचार तो चि माझा ॥4॥ 4253 ऐसें काय उणें जालें तुज देवा । भावेंविण सेवा घेसी माझी ॥1॥ काय मज द्यावा न लगे मुशारा । पहावें दातारा विचारूनि ॥ध्रु.॥ करितों पाखांडें जोडूनि अक्षरें । नव्हे Yाान खरें भिHरस ॥2॥ गुणवाद तुझे न बोलवे वाणी । आणिका छळणी वाद सांगें ॥3॥ तरी आतां मज राखें तुझे पायीं । देखसील कांहीं प्रेमरस ॥4॥ तुका ह्मणे तुज हांसतील लोक । निःकाम सेवक ह्मणोनियां ॥5॥ 4254 भोंदावया मीस घेऊनि संतांचें । करी कुटुंबाचें दास्य सदा ॥1॥ मनुष्याचे परी बोले रावा करी । रंजवी नरनारी जगामध्यें॥ध्रु.॥ तिमयाचा बैल करी सिकविलें । चित्रींचें बाहुलें गोष्टी सांगे ॥2॥ तुका ह्मणे देवा जळो हे महंती । लाज नाहीं चित्तीं निसुगातें ॥3॥ 4255 अंगीं घेऊनियां वारें दया देती । तया भHा हातीं चोट आहे ॥1॥ देव्हारा बैसोनि हालविती सुपें । ऐसीं पापी पापें लिंपताती ॥ध्रु.॥ एकीबेकीन्यायें होतसे प्रचित । तेणें लोक समस्त भुलताती ॥2॥ तयाचे स्वाधीन दैवतें असती । तरी कां मरती त्यांचीं पोरें ॥3॥ तुका ह्मणे पाणी अंगारा जयाचा । भH कान्होबाचा तो ही नव्हे ॥4॥ 4256 कोणा एकाचिया पोरें केली आळी । ठावी नाहीं पोळी मागें देखी ॥1॥ बुझाविलें हातीं देउनी खापर । छंद करकर वारियेली ॥ध्रु.॥ तैसें नको करूं मज कृपावंता । काय नाहीं सत्ता तुझे हातीं ॥2॥ तुका ह्मणे मायबापाचें उचित । करावें तें हित बाळकाचें ॥3॥ 4257 पंढरपुरींचें दैवत भजावें । काया वाचा जावें शरण त्या ॥1॥ मनीं ध्यान करी अहंता धरूनी । तया चक्रपाणी दूर ठेला ॥ध्रु.॥ मान अभिमान सांडुनियां द्यावे । अवघ्यां नीच व्हावें तरी प्राप्त ॥2॥ तुका ह्मणे हें चि कोणासी सांगावें । सादर होउनि भावें भजें देवा ॥3॥ 4258 अधमाचें चित्त अहंकारीं मन । उपदेश शीण तया केला ॥1॥ पापियाचें मन न करी आचार । विधवे शृंगार व्यर्थ केला ॥ध्रु.॥ अधमाचें चित्त दुिश्चत्त ऐकेना । वांयां सीण मना करूं काय ॥2॥ गर्धबासी दिली चंदनाची उटी । केशर लल्हाटीं शुकराच्या॥3॥ पतिवंचकेसी सांगतां उदंड । परि तें पाषांड तिचे मनीं ॥4॥ तुका ह्मणे तैसें अभावीं सांगतां । वाउगा चि चित्ता सीण होय ॥5॥ 4259 किती उपदेश करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥1॥ शुद्ध हे वासना नाहीं चांडाळाची । होळी आयुष्याची केली तेणें ॥ध्रु.॥ नाहीं शुद्ध भाव नायके वचन । आपण्या आपण नाडियेलें ॥2॥ तुका ह्मणे त्यासी काय व्याली रांड । करितो बडबड रात्रदिस ॥3॥ 4260 संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥1॥ वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥ कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । िस्त्रयेचे कीर्त्तनीं प्रेमें जागे ॥2॥ तुका ह्मणे तुह्मी क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥3॥ 4261 मणि पडिला दाढेसी मकरतोंडीं । सुखें हस्तें चि काढवेल प्रौढीं ॥1॥ परि मूर्खाचें चित्त बोधवेना । दुधें कूर्मीच्या पाळवेल सेना ॥ध्रु.॥ सकळ पृथ्वी हिंडतां कदाचित । ससीसिंगाची प्राप्त होय तेथें ॥2॥ अतिप्रयत्नें गािळतां वाळुवेतें । दिव्य तेलाची प्राप्त होय तेथें ॥3॥ अतिक्रोधें खवळला फणी पाही । धरूं येतो मस्तकीं पुष्पप्रायी ॥4॥ पहा ब्रह्मानंदें चि एकीं हेळा । महापातकी तो तुका मुH केला ॥5॥ 4262 भोळे भाविक हे जुनाट चांगले । होय तैसें केलें भिHभावें ॥1॥ ह्मणउनि चिंता नाहीं आह्मां दासां । न भ्याें गर्भवासा जन्म घेतां ॥ध्रु.॥ आपुलिया इच्छा करूं गदारोळ । भोगूं सर्वकाळ सर्व सुखें ॥2॥ तुका ह्मणे आह्मां देवाचा सांगात । नाहीं विसंबत येर येरां ॥3॥ 4263 आतां तरी माझी परिसा वीनवती । रखुमाइऩच्या पति पांडुरंगा ॥1॥ चुकलिया बाळा न मारावें जीवें । हित तें करावें मायबापीं ॥2॥ तुका ह्मणे तुझा ह्मणताती मज । आतां आहे लाज हे चि तुह्मां ॥3॥ 4264 नाही बळयोग अभ्यास कराया । न कळे ते क्रिया साधनाची ॥1॥ तुझिये भेटीचें प्रेम अंतरंगीं । नाहीं बळ अंगीं भजनाचें ॥ध्रु.॥ काय पांडुरंगा करूं बा विचार । झुरतें अंतर भेटावया ॥2॥ तुका ह्मणे सांगा वडिलपणें बुद्धी । तुजविण दयानिधी पुसों कोणां ॥3॥ 4265 जिहीं तुझी कास भावें धरियेली । त्यांची नाहीं केली सांड देवा ॥1॥ काय माझा भोग आहे तो न कळे । सुखें तुह्मी डोळे झांकियेले ॥ध्रु.॥ राव रंक तुज सारिके चि जन । नाहीं थोर लहान तुजपाशीं ॥2॥ तुका ह्मणे मागें आपंगिलें भHां । माझिया संचिता कृपा नये ॥3॥ 4266 पहावया तुझा जरि बोलें अंत । तरि माझे जात डोळे देवा ॥1॥ स्तंबीं तुज नाहीं घातलें प्रल्हादें । आपुल्या आनंदें अवतार ॥ध्रु.॥ भHाचिया काजा जालासी सगुण । तुज नाहीं गुण रूप नाम ॥2॥ ऐसा कोण देवा अधम यातीचा । निर्धार हा साचा नाहीं तुझा ॥3॥ तुका ह्मणे बोले कवतुकें गोष्टी । नेदीं येऊं पोटीं राग देवा ॥4॥ 4267 प्रगट व्हावें हे अYाानवासना । माझी नारायणा हीनबुिद्ध ॥1॥ खाणीवाणी होसी काष्टीं तूं पाषाणीं । जंतु जीवाजनीं प्रसिद्ध हा ॥ध्रु.॥ Yाानहीन तुज पाहें अल्पमति । लहान हा चित्तीं धरोनियां ॥2॥ परि तूं कृपाळ होसी देवराणा । िब्रदें तुझीं जना प्रसिद्ध हें ॥3॥ उतावीळ बहु भHांचिया काजा । होसी केशीराजा तुका ह्मणे ॥4॥ 4268 जरी तुझा मज नसता आधार । कैसा हा संसार दु†हावला ॥1॥ ऐसा बळी कोण होइल पुरता । जो हे वारी चिंता आशापाश ॥ध्रु.॥ मायामोहफांसा लोकलाजबेडी । तुजवीण तोडी कोण एक ॥2॥ हें तों मज कळों आलें अनुभवें । बरें माझ्या जीवें पांडुरंगा ॥3॥ तुका ह्मणे यास तूं चि माझा गोही । पुरी भाव नाहीं जना लोका ॥4॥ 4269 तुजविण चाड आणिकांची कांहीं । धरीन हें नाहीं तुज ठावें ॥1॥ तरणउपाय योगक्षेम माझा । ठेवियेला तुझ्या पायीं देवा ॥ध्रु.॥ कोण मज आळी काय हे तांतडी । सोनियाची घडी जाय दिस ॥2॥ तुझिया नामाचें ल्यालोंसें भूषण । कृपा संतजन करितील ॥3॥ तुका ह्मणे जाला आनंदाचा वास । हृदया या नास नव्हे कधीं ॥4॥ 4270 हें चि सुख पुढे मागतों आगळें । आनंदाचीं फळें सेवादान ॥1॥ जन्मजन्मांतरीं तुझा चि अंकिला । करूनि विठ्ठला दास ठेवीं ॥ध्रु.॥ दुजा भाव आड येऊं नेदीं चित्ता । करावा अनंता नास त्याचा ॥2॥ अभय देऊनि करावें सादर । क्षण तो विसर पडों नेदीं ॥3॥ तुका ह्मणे आह्मी जेजे इच्छा करूं । ते ते कल्पतरू पुरविसी ॥4॥ 4271 तुज केलिया नव्हे ऐसें काइऩ । डोंगराची राइऩ क्षणमात्रें॥1॥ मज या लोकांचा न साहे आघात । देखणें प्रचित जीव घेती ॥ध्रु.॥ सहज विनोदें बोलियेलों गोष्टी । अरंभी तों पोटीं न धरावी ॥2॥ दीनरूप मज करावें नेणता । याहुनी अनंता आहें तैसा ॥3॥ तुका ह्मणे जेणें मज तूं भोगसी । तें करीं जनासीं चाड नाहीं ॥4॥ 4272 ऐसा सर्व भाव तुज निरोपिला । तूं मज एकला सर्वभावें ॥1॥ अंतरींची कां हे नेणसील गोष्टी । परि सुखासाटीं बोलविसी ॥ध्रु.॥ सर्व माझा भार तुज चालवणें । तेथें म्यां बोलणें काय एक ॥2॥ स्वभावें स्वहित हिताचें कारण । कौतुक करून निवडिसी ॥3॥ तुका ह्मणे तूं हें जाणसी गा देवा । आमुच्या स्वभावा अंतरींच्या ॥4॥ 4273 लोखंडाचे न पाहे दोष । शिवोन परीस सोनें करी॥1॥ जैसी तैसी तरीं वाणी । मना आणी माउली ॥ध्रु.॥ लेकराचें स्नेहे गोड । करी कोड त्यागुणें ॥ ॥ मागें पुढें रिघे लोटी । साहे खेटी करी तें ॥3॥ तुका विनंती पांडुरंगा । ऐसें सांगा आहे हें ॥4॥ 4274. पर्वकाळीं धर्म न करी नासरी । खर्ची राजद्वारीं द्रव्यरासी ॥1॥ सोइ†याची करी पाहुणेर बरा । कांडवी ठोंबरा संतांलागीं ॥ध्रु.॥ बाइलेचीं सर्व आवडीनें पोसी । मातापितरांसी दवडोनी ॥2॥ श्राद्धीं कष्टी होय सांगतां ब्राह्मण । गोवार मागून सावडीतो ॥3॥ नेतो पानें फुलें वेश्येला उदंड । ब्राह्मणासी खांड नेदी एक ॥4॥ हातें मो†या शोधी कष्ट करी नाना । देवाच्या पूजना कांटाळतो ॥5॥ सारा वेळ धंदा करितां श्रमेना । साधूच्या दर्शना जातां कुंथे ॥6॥ हरिच्या कीर्तनीं गुंगायासि लागे । येरवीं तो जागे उगला चि ॥7॥ पुराणीं बैसतां नाहीं रिकामटी । खेळतो सोंगटी अहोरात्रीं ॥8॥ देवाच्या विभुती न पाहे सर्वथा । करी पानवथा नेत्रभिक्षा ॥9॥ गाइऩला देखोनी बदबदां मारी । घोडएाची चाकरी गोड लागे ॥10॥ ब्राह्मणाचें तीर्थ घेतां त्रास मोटा । प्रेमें घेतो घोंटा घटघटां ॥11॥ तुका ह्मणे ऐसे प्रपंचीं गुंतले । जन्मोनि मुकले विठोबासी ॥12॥ 4275 आह्मी रामाचे राऊत । वीर जुंझार बहुत ॥1॥ मनपवनतुरंग । हातीं नामाची फिरंग ॥ध्रु.॥ वारू चालवूं चहूंखुरीं । घाला घालूं यमपुरी ॥2॥ तुका ह्मणे पेणें । आह्मां वैकुंठासी जाणें॥3॥ 4276 पवित्र तें कुळ पावन तो देश । जेथें हरिचे दास घेती जन्म ॥1॥ कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक ॥ध्रु.॥ वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं ॥3॥ अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं ॥3॥ वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ॥4॥ कबीर मोमीन लतिब मुसलमान । शेणा न्हावी जाण विष्णुदास ॥5॥ काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु । भजनीं अभेदू हरिचे पायीं ॥6॥ चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी ॥7॥ नामयाची जनी कोण तिचा भाव । जेवी पंढरीराव तियेसवें ॥8॥ मैराळा जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों ॥9॥ यातायातीधर्म नाहीं विष्णुदासा । निर्णय हा ऐसा वेदशास्त्रीं ॥10॥ तुका ह्मणे तुह्मी विचारावे ग्रंथ । तारिले पतित नेणों किती ॥11॥ 4277. नामासारिखी करणी । हे तों न दिसे त्रिभुवनीं ॥1॥ सिलंगणीचें सोनें । ठेवूं नये तें गाहाण ॥ध्रु.॥ आदित्याचीं झाडें । काय त्याचा उजड पडे ॥2॥ तुका ह्मणे देवा । िब्रदें सोडोनियां ठेवा ॥3॥ 4278 येऊनि संसारा काय हित केलें । आयुष्य नासिलें शिश्नोदरा ॥1॥ विषय सेवितां कोण तृप्त जाला । इंधनीं निवाला अिग्न कोठें ॥ध्रु.॥ देखोनी मृगजळ भांबावलीं वेडीं । विचाराची थडी न टाकिती ॥2॥ ऐसियां जीवांसी सोय न लाविसी । निष्ठ‍ कां होसी कृपाळुवा ॥3॥ तुका ह्मणे देवा अगाध पैं थोरी । सर्वांचे अंतरीं पुरलासी ॥4॥ 4279 समर्थाचे सेवे बहु असे हित । विचार हृदयांत करुनी पाहें ॥1॥ वरकडोऐसा नव्हे हा समर्थ । क्षणें चि घडित सृष्टी नाशें ॥ध्रु.॥ ज्याची कृपा होतां आपणा ऐसें करी । उरों नेदी उरी दारिद्राची ॥2॥ ऐशालागीं मन वोळगे अहनिऩशीं । तेणें वंद्य होशी ब्रह्मांदिकां ॥3॥ तुका ह्मणे हें चि आहे पैं मुद्दल । सत्य माझा बोल हा चि माना ॥4॥ 4280 पिकलिये सेंदे कडुपण गेलें । तैसें आह्मां केलें पांडुरंगें ॥1॥ काम क्रोध लोभ निमाले ठायीं चि । सर्व आनंदाची सृिष्ट जाली ॥ध्रु.॥ आठव नाठव गेले भावाभाव । जाला स्वयमेव पांडुरंग ॥2॥ तुका ह्मणे भाग्य या नांवें ह्मणीजे । संसारीं जन्मीजे या चि लागीं ॥3॥ 4281 येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमागाअ ॥1॥ चंचळ चित्तासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥ भावाचा पैं हात धरावा निश्चयें । तेणें भवभय देशधडी ॥2॥ नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाइप सर्वकाळ ॥3॥ तुका ह्मणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा निश्चयाचा मेरु जाला ॥4॥ 4282 षडधसीं रांधिलें खापरीं घातलें । चोहोटा ठेविलें मध्यरात्रीं ॥1॥ त्यासी सदाचारी लोक न शिवती । श्वानासी नििश्चती फावलें तें ॥ध्रु.॥ तैसें दुष्टकर्म जालें हरिभHा । त्यागिली ममता विषयासिH ॥2॥ इहपरलोक उभय विटाळ । मानिती केवळ हरिचे दास ॥3॥ तुका ह्मणे देवा आवडे हे सेवा । अनुदिनीं व्हावा पूर्ण हेतु ॥4॥ 4283 बीज भाजुनि केली लाही । आह्मां जन्ममरण नाहीं॥1॥ आकाराशी कैंचा ठाव । देहप्रत्यक्ष जाला देव ॥ध्रु.॥ साकरेचा नव्हे उस । आह्मां कैंचा गर्भवास ॥2॥ तुका ह्मणे औघा योग । सर्वां घटीं पांडुरंग ॥3॥ 4284 वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥1॥ धारिष्ट धैर्याचा वरिष्ठ भHांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥ पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रह्म सनातन अंगसंगें ॥2॥ अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥3॥ धन्य त्याची शिH भHीची हे ख्याति । तुका ह्मणे मुिH पायीं लोळे ॥4॥ 4285 मृगाचिये अंगीं कस्तुरीचा वास । असे ज्याचा त्यास नसे ठाव ॥1॥ भाग्यवंत घेती वेचूनियां मोलें । भारवाही मेले वाहतां ओझें ॥ध्रु.॥ चंद्रामृतें तृिप्तपारणें चकोरा । भ्रमरासी चारा सुगंधाचा ॥2॥ अधिकारी येथें घेती हातवटी । परीक्षावंता दृष्टी रत्न जैसें ॥3॥ तुका ह्मणे काय अंधिळया हातीं । दिले जैसें मोतीं वांयां जाय ॥4॥ 4286 आलिया संसारीं देखिली पंढरी । कीतिऩ महाद्वारीं वानूं तुझी ॥1॥ पताकांचे भार नामाचे गजर । देखिल्या संसार सफळ जाला ॥ध्रु.॥ साधुसंतांचिया धन्य जाल्या भेटी । सांपडली लुटी मोक्षाची हे ॥2॥ तुका ह्मणे आतां हें चि पैं मागणें । पुढती नाहीं येणें संसारासी ॥3॥ 4287 ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि ह्मणति साधु॥1॥ अंगा लावूनियां राख । डोळे झांकुनी करिती पाप ॥ध्रु.॥ दावुनि वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ॥2॥ तुका ह्मणे सांगों किती । जळो तयांची संगती ॥3॥ 4288 कोणी निंदा कोणी वंदा । आह्मां स्वहिताचा धंदा॥1॥ काय तुह्मांसी गरज । आह्मी भजूं पंढरिराज ॥ध्रु.॥ तुह्मांसारिखें चालावें । तेव्हां स्वहिता मुकावें ॥2॥ तुका ह्मणे हो कां कांहीं । गळ दिला विठ्ठल पायीं ॥3॥ 4289 तुझे नामें दिनानाथा । आह्मी उघडा घातला माथा॥1॥ आतां न धरावें दुरी । बोल येइऩल ब्रीदावरी ॥ध्रु.॥ पतित होतों ऐसा ठावा । आधीं कां न विचारावा ॥2॥ तुका ह्मणे तुझे पायीं । आह्मी मिरास केली पाहीं ॥3॥ 4290 रH श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न । चिन्मय अंजन सुदलें डोळां ॥1॥ तेणें अंजनगुणें दिव्यदृिष्ट जाली । कल्पना निवाली द्वैताद्वैत ॥ध्रु.॥ देशकालवस्तुभेद मावळला । आत्मा निर्वाळला विश्वाकार ॥2॥ न जाला प्रपंच आहे परब्रह्म । अहंसोहं ब्रह्म आकळलें ॥3॥ तkवमसि विद्या ब्रह्मानंद सांग । तें चि जाला अंगें तुका आतां ॥4॥ 4291 नीत सांडोनि अवनीत चाले । भंडउभंड भलतें चि बोले ॥1॥ त्यांत कोणाचें काय बा गेलें । ज्याचें तेणें अनहित केलें ॥ध्रु.॥ ज्यासि वंदावें त्यासी निंदी । मैत्री सांडोनि होतसे दंदी॥2॥ आन यातीचे संगती लागे । संतसज्जनामध्यें ना वागे॥3॥ केल्याविण पराक्रम सांगे । जेथें सांगे तेथें चि भीक मागे ॥4॥ करी आपुला चि संभ्रम । परि पुढें कठीण फार यम ॥5॥ तुका ह्मणे कांहीं नित्यनेम । चित्तीं न धरी तो अधम ॥6॥ 4292 मानूं कांहीं आह्मी आपुलिया स्वइच्छा । नाहीं तरि सरिसा रंकरावो ॥1॥ आपुल्या उदास आहों देहभावीं । मग लज्जाजीवीं चाड नाहीं ॥2॥ तुका ह्मणे खेळों आह्मी सहजलीळे । ह्मणोनी निराळे सुख दुःख ॥3॥ 4293 बोले तैसा चाले । त्याचीं वंदीन पाउलें ॥1॥ अंगें झाडीन अंगण । त्याचें दासत्व करीन ॥ध्रु.॥ त्याचा होइऩन किंकर। उभा ठाकेन जोडोनि कर ॥2॥ तुका ह्मणे देव । त्याचे चरणीं माझा भाव ॥3॥ 4294 पाण्या निघाली गुजरी । मन ठेविलें दो घागरीं । चाले मोकऑया पदरीं । परी लक्ष तेथें ॥1॥ वावडी उडाली अंबरीं। हातीं धरोनियां दोरी । दिसे दुरिच्या दुरी । परी लक्ष तेथें॥ध्रु.॥ चोर चोरी करी । ठेवी वनांतरीं । वर्ततसे चराचरीं । परी लक्ष तेथें ॥2॥ व्यभिचारिणी नारी । घराश्रम करी । परपुरुष जिव्हारीं । परी लक्ष तेथें ॥3॥ तुका ह्मणे असों भलतिये व्यापारीं। लक्ष सर्वेश्वरीं । चुकों नेदी ॥4॥ 4295 जनाचिया मना जावें कासियेसी । माझी वाराणसी पांडुरंग ॥1॥ तेथें भागीरथी येथें भीमरथी । अधिक ह्मणती चंद्रभागा॥ध्रु.॥ तेथें माधवराव येथें यादवराज । जाणोनियां भाव पुंडलिकाचा ॥2॥ विष्णुपद गया ते चि येथें आहे । प्रत्यक्ष हें पाहे विटेवरी ॥3॥ तुका ह्मणे हे चि प्रपंच उद्धरी । आतां पंढरपुरी घडो बापा ॥4॥ 4296 नको येऊं लाजे होय तूं परती । भजों दे श्रीपती सखा माझा ॥1॥ तुझे संगतीनें मोटा जाला घात । जालों मी अंकित दुर्जनाचा ॥2॥ तुका ह्मणे रांडे घेइन काठीवरी । धनी सहाकारी राम केला ॥3॥ 4297 भिHॠण घेतलें माझें । चरण गाहाण आहेत तुझे॥1॥ प्रेम व्याज देइप हरी । माझा हिशेब लवकरी करीं ॥ध्रु.॥ माझें मी न सोडीं धन । नित्य करितों कीर्त्तन ॥2॥ तुझें नाम आहे खत । सुखें करी पंचाइऩत ॥3॥ तुका ह्मणे गरुडध्वजा । यासी साक्ष श्रीगुरुराजा ॥4॥ 4298 फिरविलें देऊळ जगामाजी ख्याति । नामदेवा हातीं दुध प्याला ॥1॥ भरियेली हुंडी नरसी महत्याची । धनाजीजाटाचींसेतें पेरी ॥ध्रु.॥ मिराबाइऩसाटीं घेतों विष प्याला । दामाजीचा जाला पाढेवार ॥2॥ कबीराचे मागीं विणूं लागे सेले । उठविलें मूल कुंभाराचें ॥3॥ आतां तुह्मी दया करा पंढरिराया । तुका विनवी पायां नमीतसे ॥4॥ 4299 हे चि वेळ देवा नका मागें घेऊं । तुह्मांविण जाऊं शरण कोणा ॥1॥ नारायणा ये रे पाहें विचारून । तुजविण कोण आहे मज ॥ध्रु.॥ रात्रहि दिवस तुज आठवूनि आहें । पाहातोसी काये सkव माझें ॥2॥ तुका ह्मणे किती येऊं काकुलती । कांहीं माया चित्तीं येऊं द्यावी ॥3॥ 4300 इंद्रावणा केलें साकरेचें आळें । न सांडी वेगळें कडुपण ॥1॥ कावऑयाचें पिलूं कौतुकें पोशिलें । न राहे उगलें विष्ठेविण ॥ध्रु.॥ क्षेम देतां अंगा गांधेलाची पोळी । करवी नादाळी महाशब्द ॥2॥ तुका ह्मणे ऐसे न होती ते भले । घालिती ते घाले साधुजना ॥3॥ 4301 मुसळाचें धनु नव्हे हो सर्वथा । पाषाण पििळतां रस कैंचा ॥1॥ वांझे बाळा जैसें दुध नाहीं स्तनीं । गारा त्या अधणीं न सिजती ॥ध्रु.॥ नवखंड पृथ्वी पिके मृगजळें । डोंगर भेटे बळें असमानासी ॥2॥ नैश्वर ब्रह्म तेव्हां होय ब्रह्म । तुका ह्मणे श्रम करुनी काय ॥3॥ 4302 धन्या आतां काय करूं । माझें तान्हुलें लेकरूं॥1॥ धन्या अवचित मरण आलें । मज कोणासी निरविलें ॥ध्रु.॥ माझें दारवंड नका पाडूं । त्याचे हात पाय तोडूं ॥2॥ एके हातीं धरली दाढी । घे कु†हाडी दुजे हातीं ॥3॥ येरी घाव घालूं पाहे । तंव तो उठोनि उभा राहे ॥4॥ तुका ह्मणे अवघीं चोरें । सेकी रामनाम सोइरें ॥5॥ 4303 निरंजनीं आह्मीं बांधियेलें घर । निराकारीं निरंतर राहिलों आह्मी ॥1॥ निराभासीं पूर्ण जालों समरस । खंड ऐक्यास पावलों आह्मी ॥2॥ तुका ह्मणे आतां नाहीं अहंकार । जालों तदाकार नित्य शुद्ध ॥3॥ 4304 पांडुरंगें सत्य केला अनुग्रह । निरसोनि संदेह बुिद्धभेद॥1॥ जीवशिवा सेज रचिली आनंदें । औठावे पदीं आरोहण॥2॥ निजीं निजरूपीं निजविला तुका । अनुहाते बाळका हलरु गाती ॥3॥ 4305 नाना मतांतरें शब्दाची वित्पित्त । पाठांतरें होती वाचाळ ते ॥1॥ माझ्या विठोबाचें वर्म आहे दुरी । कैंची तेथें उरी देहभावा ॥ध्रु.॥ यYा याग जप तप अनुष्ठान । राहे ध्येय ध्यान आलीकडे ॥2॥ तुका ह्मणे होय उपरति चित्ता । अंगीं सप्रेमता येणें लागें ॥3॥ 4306 नाहीं शब्दाधीन वर्म आहे दुरी । नव्हे तंत्रीं मंत्रीं अनुभव तो ॥1॥ हर्षामषॉ अंगीं आदळती लाटा । कामक्रोधें तटा सांडियेलें ॥ध्रु.॥ न सरे ते भिH विठोबाचे पायीं । उपरति नाहीं जेथें चित्ता ॥2॥ तुका ह्मणे सुख देहनिरसनें । चिंतनें चिंतन तद्रूपता ॥3॥ 4307 शोधूनि अन्वय वंश वंशावळी । परस्परा कुळीं उच्चारण ॥1॥ ह्मणविलें मागें पुढें चाले कैसें । केला सामरस्यें अभिषेक ॥ध्रु.॥ एकछत्र झळके उन्मनी निशाणी । अनुहाताच्या ध्वनी गगन गर्जे ॥2॥ तुकया स्वामी स्थापी निजपदीं दासा । करूनि उल्हासा सप्रेमता ॥3॥ 4308 प्रवृित्तनिवृत्तीचे आटूनियां भाग । उतरिलें चांग रसायण॥1॥ Yाानािग्नहुताशीं कडशिले वोजा । आत्मसििद्धकाजा लागूनियां ॥ध्रु.॥ ब्रह्मीं ब्रह्मरस शीघ्र जाला पाक । घेतला रुचक प्रतीतीमुखें ॥2॥ स्वानुभवें अंगीं जाला समरस । साधनी निजध्यास ग्रासोग्रासीं ॥3॥ अरोग्यता तुका पावला अष्टांगीं । मिरविला रंगीं निजात्मरंगें ॥4॥ 4309 काय बा करिशी सोवळें ओवळें । मन नाहीं निर्मळ वाउगें चि ॥1॥ काय बा करीसी पुस्तकांची मोट । घोकितां हृदयस्फोट हाता नये ॥ध्रु.॥ काय बा करीसी टाळ आणि मृदंग । जेथें पांडुरंग रंगला नाहीं ॥2॥ काय बा करीसी Yाानाचिया गोष्टी । करणी नाहीं पोटीं बोलण्याची ॥3॥ काय बा करीसी दंभलौकिकातें। हित नाहीं मातें तुका ह्मणे ॥4॥ 4310 स्वामी तूं ही कैसा न पडसी डोळां । सुंदर सांवळा घवघवीत ॥1॥ चतुर्भुज माळा रुळे एकावळी । कस्तुरी निडळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥ शंख चक्रा गदा रुळे वैजयंती । कुंडलें तळपती श्रवणीं दोन्ही ॥2॥ तुका ह्मणे स्वामी आतां दावीं पाय । पांडुरंग माय कृपावंते ॥3॥ 4311 आणीक कोणापुढें वासूं मुख सांग । कीं माझें अंतरंग कोण जाणे ॥1॥ पाहें तुजकडे येऊनि जाऊनी । पांडुरंगा मनीं विचारावें ॥ध्रु.॥ भय चिंता अवघे उद्योग सांडिले । आठवुनी पाउलें असें तुझीं ॥2॥ नका विसरूं मज वैकुंठनायका । विनवितो तुका बंदीजन ॥3॥ 4312 सद्ग‍ूचे चरणीं ठेविला मस्तक । देउनियां हस्तक उठविलें ॥1॥ उठविलें मज देऊनियां प्रेम । भावाथॉ सप्रेमे नमस्कारीं॥2॥ नमस्कारीं त्याला सद्ग‍ुरायाला । तुका ह्मणे बोला नाम वाचें ॥3॥ 4313 सद्ग‍ूने मज आशीर्वाद दिला । हरुष भरला हृदयीं माझे ॥1॥ हृदयींचा भाव कळला गुरूसी । आनंदउल्हासीं बोले मज ॥2॥ बोले मज गुरू कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं आनंदलों ॥3॥ 4314 आनंदाचा कंद गाइयेला गीतीं । पाहियेला चित्तीं देवराव ॥1॥ देवराव तो ही आहे निश्चयेसीं । अखंड नामासी बोलवितो ॥2॥ बोलवितो मज कृपा तो करूनि । तुका ह्मणे मनीं धरा भाव ॥3॥ 4315 सातादिवसांचा जरी जाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥1॥ फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥ शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्त्तनाचा रंग सोडों नये ॥2॥ तुका ह्मणे ऐसा नामीं ज्या निर्धार । तेथें निरंतर देव असे ॥3॥ 4316 चला आळंदीला जाऊं । Yाानदेवा डोळां पाहूं ॥1॥ होतिल संताचिया भेटी । सुखाचिया सांगों गोष्टी ॥ध्रु.॥ Yाानेश्वर Yाानेश्वर । मुखीं ह्मणतां चुकती फेर ॥2॥ तुह्मां जन्म नाहीं एक । तुका ह्मणे माझी भाक ॥3॥ 4317 चरणीं नमन सद्ग‍ूच्या पूर्ण । नित्य हरिगुण गाऊं सदा ॥1॥ गोवर्धन जेणें नखीं हो धरिला । काऑया नाथिला महाबळी ॥ध्रु.॥ ऐसे हरिगुण गातो वाचेवरि । पतितासी तारी जनादऩन ॥2॥ तुका ह्मणे हें चि सज्जना जीवन । वाचेसी स्मरण गोविंदाचें ॥3॥ 4318 सद्ग‍ूवांचूनि प्रेतरूप वाणी । बोलती पुराणीं व्यासॠषि॥1॥ ह्मणोनि तयाचें पाहूं नये तोंड । निगुरा अखंड सुतकाळा ॥ध्रु.॥ कोणे परी तया नव्हे चि सुटका । देह त्याचा लटिका जाणा तुह्मी ॥2॥ तुका ह्मणे ऐसीं बोलती पुराणें । संतांचीं वचनें मागिलां हो ॥3॥ 4319 डिवेना डसेना बुझेना निर्मळ । परि अमंगळ स्वीकारीना॥1॥ परंतु गर्धब अपवित्र जाणा । पर्वकाळीं दाना देऊं नये ॥ध्रु.॥ डिवी लात्री बुजे बहु नेदी दुध । मुखीं नाहीं शुद्ध विष्ठा खाय ॥2॥ परंतु ते गाय पवित्र हो जाणा । पर्वकाळीं दाना देऊजेते॥3॥ ब्राह्मणें ब्राह्मणा सद्ग‍ू करावा । परि न करावा शूद्रादिक ॥4॥ तुका ह्मणे देवें सांगितली सोय । ह्मणोनि त्याचे पाय धरिले जीवें ॥5॥ 4320 संसारींचें ओझें वाहता वाहाविता । तुजविण अनंता नाहीं कोणी ॥1॥ गीतेमाजी शब्द दुंदुभीचा गाजे । योगक्षेमकाज करणें त्याचें ॥ध्रु.॥ चतुर्भुजा करीं वारू शृंगारावे । सारथ्य करावें अर्जुनाचें ॥2॥ श्वपच अंत्यज भिHस्नेहें जाला । अचळपदीं केला ध्रुव तुका ॥3॥ 4321 कवणदिस येइल कैसा । न कळे संपत्तीचा भरंवसा॥1॥ चौदा चौकडिया लंकापति । त्याची कोण जाली गती ॥ध्रु.॥ लंकेसारिखें भुवन । त्याचें त्यासी पारखें जाण ॥2॥ तेहतीस कोटि बांदवडी । राज्य जातां न लगे घडी ॥3॥ ऐसे अहंतेनें नाडिले । तुका ह्मणे वांयां गेले ॥4॥ 4322 लटिका प्रपंच वांजेची संतति । तत्वYाा हे भ्रांति बाधूं नेणे ॥1॥ सूर्यबिंबीं काय अंधार रिघेल । मृगजळें तिंबेल नभ काइऩ ॥ध्रु.॥ तैसा दृश्यभास नाडळे चि डोळा । प्रकाशसोहळा भोगीतसे ॥2॥ भोग भोग्य भोHा नाडळे चि कांहीं । चैतन्यविग्रहीं पूर्णकाम ॥3॥ तुका ब्रह्मानंदीं आहे तुकब्रह्म । प्रपंचाचें बंड न देखे डोळां ॥4॥ 4323 न ह्मणे वो आह्मी आपुलेनि चित्तीं । निःशेष अतिप्रीति विषयीं तो ॥1॥ खोटा तो विटाळ । ह्मणोनि गाबाळ सांडियेले॥ध्रु.॥ भांगतमाखूचा चित्ताचा आदर । कोरडें उत्तर चाटावें तें ॥2॥ तुका ह्मणे आह्मी नव्हों फजितखोर । तुटीचा व्यापार करावया ॥3॥ 4324 अनाथाचा नाथ पतितपावन । दीनाचें रक्षण करीतसे॥1॥ ऐसें जाणोनियां नामीं विश्वासलों । भीमातिरा आलों धांवत चि ॥ध्रु.॥ स्नान हें करितां त्रिताप निवाले । महाद्वारा आलें मन माझें ॥2॥ तेथें अनुमात्र रीग नव्हे याचा । परतलों साचा तेथूनियां ॥3॥ पुंडलिकापाशीं येऊनि पुसिलें । चिन्मय दाटलें जनादऩन ॥4॥ तुका ह्मणे आतां दुजा देव नाहीं । बाप तरी आइऩ तो चि विठो ॥5॥ 4325 ढालतलवारे गुंतले हे कर । ह्मणे जुंझणार कैसा जुंझे ॥1॥ पेटी पडदळे सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥ बैसविलें मला येणें अश्वावरी । धावूं पळूं तरी कैसा आतां ॥2॥ असोनि उपाय ह्मणे हे अपाय । ह्मणे हायहाय काय करूं ॥3॥ तुका ह्मणे हा तों स्वयें परब्रह्म । मूर्ख नेणे वर्म संतचरण ॥4॥ 4326 किडा अन्नाचें मानुस । त्याचा ह्मणविल्या दास॥1॥ तें ही त्यासी उपेक्षीना । बोल आपुला सांडीना ॥ध्रु.॥ तो तूं नराचा नरेंद्र । तुजपासूनि इंद्र चंद्र ॥2॥ तुका ह्मणे विश्वंभर । तुज वर्णी फणीवर ॥3॥ 4327 कोटिजन्म पुण्यसाधन साधिलें । तेणें हाता आलें हरिदास्य ॥1॥ रात्रीं दिवस ध्यान हरीचें भजन । कायावाचामन भगवंतीं ॥ध्रु.॥ ऐसिया प्रेमळा ह्मणताती वेडा । संसार रोकडा बुडविला ॥2॥ एकवीस कुळें जेणें उद्धरिलीं । हे तों न कळे खोली भाग्यमंदा ॥3॥ तुका ह्मणे त्याची पायधुळी मिळे । भवभय पळे वंदितां चि ॥4॥ 4328 उपजला प्राणी न राहे संसारीं । बैसला सेजारी काळ उसां ॥1॥ पाहा तो उंदीर घेउनि जाय बोका । तैसा काळ लोका नेत असे ॥ध्रु.॥ खाटिकाचे घरीं अजापुत्र पाहें । कसाबाची गाय वांचे कैसी ॥2॥ तुका ह्मणे कांहीं करा काढाकाढी । जाती ऐसी घडी पुन्हा नये ॥3॥ 4329 पंढरीस जाऊं ह्मणती । यम थोर चिंता करि ती ॥1॥ या रे नाचों ब्रह्मानंदें । विठ्ठलनामाचिया छंदें ॥ध्रु.॥ धरिली पंढरीची वाट । पापें रिगालीं कपाट ॥2॥ केलें भीमरेचें स्नान । यमपुरी पडिले खान ॥3॥ दुरोनि देखिली पंढरी । पापें गेलीं दुरच्यादुरी ॥4॥ दुरोनि देखिलें राउळ । हरुषें नाचती गोपाळ ॥5॥ तुका ह्मणे नाहीं जाणें । अखंड पंढरिराहणें ॥6॥ 4330 पय दधि घृत आणि नवनीत । तैसें दृश्यजात एकपणें ॥1॥ कनकाचे पाहीं अलंकार केले । कनकत्वा आले एकपणें ॥ध्रु.॥ मृित्तकेचे घट जाले नानापरी । मृित्तका अवधारीं एकपणें ॥2॥ तुका ह्मणे एक एक ते अनेक । अनेकत्वीं एक एकपणा ॥3॥ 4331 पंधरा दिवसांमाजी साक्षात्कार जाला । विठोबा भेटला निराकार ॥1॥ भांबगिरिपाठारीं विस्त जाण केली । वृित्त थिरावली परब्रह्मीं ॥ध्रु.॥ निर्वाण जाणोनि आसन घातलें । ध्यान आरंभिलें देवाजीचें ॥2॥ सर्प विंचू व्याघ्र आंगासी झोंबले । पीडूं जे लागले सकिळक ॥3॥ दीपकीं कर्पूर कैसा तो विराला । तैसा देह जाला तुका ह्मणे ॥4॥ 4332 अYाान हा देह स्वरूपीं मीनला । सर्व वोसावला देहपात ॥1॥ Yाानस्वरूपाची सांगड मिळाली । अंतरीं पाहिली Yाानज्योती ॥2॥ तुका ह्मणे चित्त स्वरूपीं राहिलें । देह विसावलें तुझ्या पायीं ॥3॥ 4333 दामाजीपंताची रसद गुदरली । लज्जा सांभािळली देवरायें ॥1॥ तयाचें चरित्र परिसा हो सादरें । करितों नमस्कार संतजना ॥ध्रु.॥ मंगळवेढा असे विस्त कुटुंबेंसी । व्यापारी सर्वांसी मान्य सदा ॥2॥ कर्म काय करी ठाणाचा हवाला । तों कांहीं पडला कठिण काळ ॥3॥ धान्याचीं भांडारें होतीं तीं फोडिलीं । पंढरी रिक्षली दुष्काळांत ॥4॥ दुबळें अनाथ तें हि वांचविलें । राष्टधांत ते जाली कीिर्त्त मोठी ॥5॥ मुजुम करीत होता कानडा ब्राह्मण । फिर्याद लिहून पाठविली ॥6॥ अविंदाचें राज्य बेदरीं असतां । कागद पाहतां तलब केली ॥7 ॥ दामाजीपंतासी धरोनि चालविलें । इकडे या विठ्ठलें माव केली ॥8॥ विकते धारणे सवाइऩचें मोल । धान्याचें सकळ द्रव्य केलें ॥9॥ दामाजीपंताच्या नांवें अर्जदास्त । लिहून खलेती मुद्रा केली ॥10॥ विठो पाडेवार भHां साहए जाला । वेदरासी गेला रायापासीं ॥11॥ जोहार मायबाप पुसती कोठील । तंव तो ह्मणे स्थळ मंगळवेढें ॥12॥ दामाजीपंतांनीं रसद पाठविली । खलेती ओतिली अर्जदास्त ॥13॥ देखोनियां राजा संतोष पावला । ह्मणे व्यर्थ त्याला तलब केली॥14॥ काय तुझें नांव पुसती यंत्रधारी । तो ह्मणे बेगारी विठा कां जी॥15॥ पावल्याचा जाब द्यावा मायबाप । करोनि घेतों माप ह्मणती ते॥16॥ पावल्याचा जाब दिधला लिहून । तसरीफ देऊन पाठविला ॥17॥ छत्री घोडा शिबिका आभरणांसहित । दिला सवें दूत पाठवूनि॥18॥ वाटे चुकामुक जाली याची त्यांची । ते आले तैसे चि मंगळवेढा॥19॥ दामाजीपंतासी बेदरासी नेलें । राजा ह्मणे जालें कवतुक ॥20॥ काल गेला विठा बेगारी देऊन । तसरीफ देऊन जाब दिला ॥21॥ काय तुमचें काज बोला जी सत्वर । बोलाजी निर्धार वचनाचा॥22॥ कैंचा विठा कोण पाठविला कधीं । काढोनियां आधीं जाब दिला॥23॥ पहातां चि जाब हृदय फुटलें । नयन निडारले राजा देखे ॥24॥ सावळें सकुमार रूप मनोहर । माथां तेणें भार वाहियेला ॥25॥ दामाजीपंतासी रायें सन्मानिलें । तो ह्मणे आपुलें कर्म नव्हे ॥26॥ आतां तुमची सेवा पुरे जी स्वामिया । शिणविलें सखया विठोबासी॥27॥ निरोप घेऊनि आला स्वस्थळासी । उदास सर्वासीं होता जाला ॥28॥ दामाजीपंतांनीं सेविली पंढरी । ऐसा त्याचा हरि निकटवृित्त ॥29॥ तुका ह्मणे विठो अनाथ कैवारी । नुपेक्षी हा हरि दासालागीं ॥30॥ 4334 पहिली माझी ओवी ओवीन जगत्र । गाइऩन पवित्र पांडुरंग ॥1॥ दुसरी माझी ओवी दुजें नाहीं कोठें । जनीं वनीं भेटे पांडुरंग ॥ध्रु.॥ तिसरी माझी ओवी तिळा नाहीं ठाव । अवघा चि देव जनीं वनीं ॥2॥ चवथी माझी ओवी वैरिलें दळण । गाइऩन निधान पांडुरंग ॥3॥ पांचवी माझी ओवी ते माझिया माहेरा । गाइऩन निरंतरा पांडुरंगा ॥4॥ साहावी माझी ओवी साहा ही आटले। गुरूमूर्त्त भेटले पांडुरंग ॥5॥ सातवी माझी ओवी आठवे वेळोवेळां। बैसलासे डोळां पांडुरंग ॥6॥ आठवी माझी ओवी आठावीस योग। उभा चंद्रभागे पांडुरंग ॥7॥ नववी माझी ओवी सरलें दळण। चुकलें मरण संसारीचें ॥8॥ दाहावी माझी ओवी दाहा अवतारा । न यावें संसारा तुका ह्मणे ॥9॥ 4335 धरोनियां फरश करी । भHजनाचीं विघ्नें वारी॥1॥ ऐसा गजानन महाराजा । त्याचें चरणीं हालो लागो माझा ॥ध्रु.॥ सेंदुर शमी बहुिप्रय ज्याला । तुरा दुर्वांचा शोभला ॥2॥ उंदिर असे जयाचें वहन । माथां जडितमुगुट पूर्ण ॥3॥ नागयYाोपवीत रुळे । शुभ्र वस्त्र शोभित साजिरें ॥4॥ भावमोदक हराभरी । तुका भावें हे पूजा करी ॥5॥ 4336 नाम आहे जयापाशीं । जेथें राहे तेथें चि काशी॥1॥ ऐसा नामाचा महिमा । जाणे वाल्मीक शंकर उमा ॥ध्रु.॥ नाम प्र†हादबाळ । जाणे पापी आजामेळ ॥2॥ नाम जाणे तो नारद । नामें ध्रुवा अक्षय पद ॥3॥ नाम गणिकेतें तारी । पशु गजेंद्र उद्धारी॥4॥ नाम जाणे हणुमंत । जाणताति महासंत ॥5॥ नाम जाणे शुकमूतिऩ । जाणे राजा परििक्षती ॥6॥ नाम जाणे तुका । नाहीं संसाराचा धोका ॥7॥ 4337 बहुतां जन्मां अंतीं जन्मलासी नरा । देव तूं सोइरा करीं आतां ॥1॥ करीं आतां बापा स्वहिताचा स्वार्थ । अनर्थाचा अर्थ सांडीं आतां ॥ध्रु.॥ सांडि आतां कुडी कल्पनेची वाट । मार्ग आहे नीट पंढरीचा ॥2॥ पंढरीस जावें सर्व सुख घ्यावें । रूप तें पाहावें विटेवरि ॥3॥ विटेवरि नीट आनंदाचा कंद । तुका नाचे छंद नामघोषें ॥4॥ 4338 किती सांगों तरि नाइकति बटकीचे । पुढें सिंदळीचे रडतील ॥1॥ नका नका करूं रांडेची संगती । नेवोनी अधोपाती घालिल यम ॥2॥ तुका ह्मणे जरी देवीं नाहीं चाड । हाणोनि थोबाड फोडिल यम ॥3॥ 4339 उधानु काटीवरि चोपडुची आस । नवरा राजस मिरवतसे ॥1॥ जिव्हाऑयाचा काठी उबाऑयाच्या मोटा । नवरा चोहटा मिरवतसे ॥ध्रु.॥ तुळसीची माळ नवरीचे कंठीं । नोवरा वैकुंठीं वाट पाहे ॥2॥ तुका ह्मणे ऐसी नोव†याची कथा । परमार्थ वृथा बुडविला ॥3॥ 4340 न कळे महिमा वेद मोनावले । जेथें पांगुळले मनपवन ॥1॥ चंद्र सूर्य ज्याचें तेज वागविती । तेथें माझी मती कोणीकडे ॥ध्रु.॥ काय म्यां वाणावें तुझ्या थोरपणा । सहस्रवदना वर्णवेना ॥2॥ तुका ह्मणे आह्मी बाळ तूं माउली । कृपेची साउली करीं देवा ॥3॥ 4341 संतचरणरज लागतां सहज । वासनेचें बीज जळोन जाय ॥1॥ मग रामनामीं उपजे आवडी । सुख घडोघडी वाढों लागे ॥ध्रु.॥ कंठीं प्रेम दाटे नयनीं नीर लोटे । हृदयीं प्रगटे रामरूप॥2॥ तुका ह्मणे साधन सुलभ गोमटें । परि उपतिष्ठे पूर्वपुण्यें ॥3॥ 4342 विधवेसि एक सुत । अहनिऩशीं तेथें चित्त ॥1॥ तैसा तूं मज एकला । नको मोकलूं विठ्ठला ॥ध्रु.॥ सुपुत्रालागीं बाप । अवघे तेथें चि संकल्प ॥2॥ तुका ह्मणे चित्तीं । पतिव्रते जैसा पति॥3॥ 4343 ह्मणे विठ्ठल पाषाण । त्याच्या तोंडावरि वाहाण॥1॥ नको नको दर्शन त्याचें । गलितकुष्ट भरो वाचे ॥ध्रु.॥ शािळग्रामासि ह्मणे धोंडा । कोड पडो त्याच्या तोंडा ॥2॥ भावी सद्ग‍ु मनुष्य । त्याचें खंडो का आयुष्य ॥3॥ हरिभHाच्या करी चेष्टा । त्याचे तोंडीं पडो विष्ठा ॥4॥ तुका ह्मणे किती ऐकों । कोठवरी मर्यादा राखों ॥5॥ 4344 स्वगाअचे अमर इिच्छताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आह्मां ॥1॥ नारायणनामें होऊं जिवनमुH । किर्त्तनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥ वैकुंठींचे जन सदा चिंतिताति । कइं येथें येती हरिचे दास ॥2॥ यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥3॥ तुका ह्मणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि॥4॥ 4345 व्यापक हा विश्वंभर । चराचर याचेनी ॥1॥ पंढरिराव विटेवरि । त्याचींच धरीं पाउलें ॥ध्रु.॥ अवघियांचा हा चि ठाव । देवोदेवीं सकळ ॥2॥ तुका ह्मणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे॥3॥ 4346 पसरोनि मुखें । कैसे धालों बा हारीखें ॥1॥ ब्रह्मादिका दुर्लभ वांटा । आह्मां फावला राणटां ॥ध्रु.॥ गोड लागे काय तरि। कृपावंत जाला हरि ॥2॥ उडती थेंबुटें । अमृताहुनि गोमटें ॥3॥ गोडाहुनि गोड । जिव्हा नाचे वाटे कोड ॥4॥ खुणावुनि तुका । दावी वर्म बोलों नका ॥5॥ 4347 आमुचि मिरास पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥1॥ पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाइऩ आमुचि माता ॥ध्रु.॥ भाव पुंडलीक मुनि । चंद्रभागा आमुची बहिणी ॥2॥ तुका जुन्हाट मिराशी । ठाव दिला पायांपाशीं ॥3॥ 4348 गंगा गेली सिंधुपाशीं । जरी तो ठाव नेदी तिशी॥1॥ तिणें जावें कवण्या ठाया । मज सांगा पंढरिराया ॥ध्रु.॥ जळ क्षोभलें जलचरां । माता बाळा नेदी थारा ॥2॥ तुका ह्मणे आलों शरण । देवा त्वां कां धरिलें मौन्य ॥3॥ 4349 बैसो आतां मनीं । आले तैसें चि वदनीं ॥1॥ मग अवघें चि गोड । पुरे सकळ हि कोड ॥ध्रु.॥ बाहेरील भाव । तैसा अंतरीं हि वाव ॥2॥ तुका ह्मणे मणि । शोभा दाखवी कोंदणीं॥3॥ 4350 वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥1॥ रूप डसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥ कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरि ॥2॥ तुका ह्मणे आस । संनिध चि जगदीशा॥3॥ 4351 सर्वसुखा अधिकारी । मुखें उच्चारी हरिनाम ॥1॥ सर्वांगें तो सवाौत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥ ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥2॥ तुका ह्मणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा॥3॥ 4352 जो का निर्गुण निराकार । तेथें धरियेले अवतार॥1॥ निर्गुण होता तो सगुणासि आला । भिHसाटीं प्रगटला ॥ध्रु.॥ जो का त्रिभुवनचाळक । तो हा नंदाचा बाळक ॥2॥ सोडविलें वसुदेवदेवकीसि । अवतार धरिला तिचे कुशी ॥3॥ मारियेला कंसराणा । राज्यीं स्थापिलें उग्रसेना ॥4॥ तुका ह्मणे देवादिदेव । तो हा उभा पंढरिराव ॥5॥ 4353 जुनाट हें धन अंत नाहीं पार । खात आले फार सरलें नाहीं ॥1॥ नारद हा मुनि शुक सनकादिक । उरलें आमुप तुह्मां आह्मां ॥ध्रु.॥ येथूनियां धना खाती बहु जन । वाल गुंज उणें जालें नाहीं ॥2॥ तुका ह्मणे धना अंत नाहीं पार । कुंटित चार वाचा तेथें ॥3॥ 4354 कोडियाचें गोरेपण । तैसें अहंकारीYाान ॥1॥ त्यासि अंतरीं रिझे कोण । जवळी जातां चिळसवाण ॥ध्रु.॥ प्रेतदेह गौरविलें। तैसें विटंबवाणें जालें ॥2॥ तुका ह्मणे खाणें विष्ठा । तैशा देहबुिद्धचेष्टा॥3॥ 4355 पाया जाला नारू । तेथें बांधला कापूरु । तेथें बिबव्याचें काम । अधमासि तों अधम ॥1॥ रुसला गुलाम । धणी करीतो सलाम । तेथें चाकराचें काम । अधमासि तों अधम ॥ध्रु.॥ रुसली घरची दासी । धणी समजावी तियेसि । तेथें बटकीचें काम। अधमासि तों अधम ॥2॥ देव्हा†यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला । तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥3॥ तुका ह्मणे जाती । जातीसाटीं खाती माती ॥4॥ 4356 ब्राह्मणा न कळे आपुलें तें वर्म । गंवसे परब्रह्म नामें एका ॥1॥ लहानथोरासि करितों प्रार्थना । दृढ नारायणा मनीं धरा॥ध्रु.॥ सर्वांप्रति माझी हे चि असे विनंती । आठवा श्रीपती मनामाजी ॥2॥ केशव नारायण करितां आचमन । ते चि संध्या स्नान कर्म क्रिया ॥3॥ नामें करा नित्य भजन भोजन । ब्रह्मकर्म ध्यान याचे पायीं ॥4॥ तुका ह्मणे हें चि निर्वाणींचें शस्त्र । ह्मणोनि सर्वत्र स्मरा वेगीं ॥5॥ 4357 नरदेह वांयां जाय । सेवीं सद्ग‍ूचे पाय ॥1॥ सांडोनियां अहंभाव । धरीं भHी पूजीं देव ॥ध्रु.॥ थोराचिये वाटे। जातां भवशोक आटे ॥2॥ प्रल्हादातें तारी । तुका ह्मणे तो कंठीं धरीं ॥3॥ 4358 संचित तैशी बुिद्ध उपजे मनामधीं । सांगितलें सििद्ध नव जाय ॥1॥ ज्याचा जैसा ठेवा तो त्यापाशीं धांवे । न लगती करावे उपदेश ॥2॥ घेऊन उठती आपुलाले गुण । भविष्याप्रमाणें तुका ह्मणे ॥3॥ 4359 कुरंगीपाडस चुकलेसे वनीं । फुटे दुःखेंकरोनि हृदय त्याचें ॥1॥ तैसा परदेशी जालों तुजविण । नको हो निर्वाण पाहूं माझें ॥ध्रु.॥ अपराध्याच्या कोटि घालीं सर्व पोटीं । नको या शेवटीं उपेक्षूं गा ॥2॥ तुका ह्मणे असों द्यावी माझी चिंता । कृपाळु अनंता पांडुरंगा ॥3॥ 4360 धन्य जालों हो संसारीं । आह्मी देखिली पंढरी ॥1॥ चंद्रभागे करूं स्नान । पुंडलीकाचें दर्शन ॥ध्रु.॥ करूं क्षेत्रप्रदिक्षणा। भेटूं सत या सज्जनां ॥2॥ उभे राहूं गरुडपारीं । डोळेंभरुनी पाहों हरी ॥3॥ तुका ह्मणे वाळवंटीं । महालाभ फुकासाटीं ॥4॥ 4361 पंढरीचा वारकरी । खेपा वैकुंठबंदरीं ॥1॥ तया नाहीं आणखी पेणें । सदा वैकुंठीं राहाणें ॥ध्रु.॥ आला गेला केल्या यात्रा । उद्धरिलें कुळा सर्वत्रा ॥2॥ तुका ह्मणे नाहीं । यासि संदेह कल्पांतीं ही ॥3॥ 4362 सोडियेल्या गाइऩ नवलक्ष गोपाळीं । सवें वनमाळी चालियेला ॥1॥ सुदीन समय भाग्याचा उदय । चारावया गाइऩ वनामाजी ॥ध्रु.॥ गाइऩगोपाळांच्या संगें चाली हरि । क्रीडा नानापरि खेळताति ॥2 ॥ काठी कांबळीया मोहरीया पोंवा । सिदोरी गांजिवा खांद्यावरि ॥3॥ गोधनें संवगडे खेळे नानापरी । आले भीमातीरीं वेणुनादा ॥4॥ तेथें उभा ठेला गोपाळांसहित । सिदोरिया सोडीत बैसे तेथें ॥5॥ तुका ह्मणे ज्यांनीं आणिल्या भाकरी । नेऊनियां हरीपुढें देती ॥6॥ 4363 ज्यां जैसी आवडी त्यां तैसा विभाग । देत पांडुरंग तृिप्त जाली ॥1॥ मुखींचें उिच्छष्ट हिरोनियां खात । वििस्मत विधाता देखोनियां ॥ध्रु.॥ दिलें जें गोपाळां तें नाहीं कोणासि । वििस्मत मानसीं सुरवर ॥2॥ देव ॠषि मुनि सिद्ध हे चारण । शिव मरुद्गण चंद्र सूर्य ॥3॥ तुका ह्मणे आले सकळ हि सुरवर । आनंदें निर्भर पाहावया ॥4॥ 4364 आले सुरवर नानापक्षी जाले । सकळ अवतरले श्वापदवेषें ॥1॥ श्वानखररूपी होऊनियां आले । उिच्छष्ट कवळ वेचिताति ॥ध्रु.॥ होऊनियां दीन हात पसरिती । मागोनियां घेती उष्टावळी ॥2॥ अभिमान आड घालोनि बाहेरि । तयां ह्मणे घ्या रे धणी ॥3॥ तुका ह्मणे धणी लाधली अपार । तया सुखा पार काय सांगों ॥4॥ 4365 एकमेकीं घेती थडका । पाडी धडका देऊनि ॥1॥ एकमेका पाठीवरि । बैसोनि करिती ढवाळी ॥ध्रु.॥ हाता हात हाणे लाही । पळतां घाइऩ चुकविती ॥2॥ तुका ह्मणे लपणी चपणी । एका हाणी पाठीवरी ॥3॥ 4366 चला वळूं गाइऩ । दूर अंतरल्या भाइऩ ॥1॥ खेळ खेळतां जाला शीण । कोण करी वणवण ॥ध्रु.॥ गाइऩ हकारी कान्हया । ह्मणोनि लागती ते पायां ॥2॥ तुका ह्मणे द्यावें । नाम संकीर्तन बरवें ॥3॥ 4367 नाहीं संसाराची चाड । गाऊं हरिचें नाम गोड ॥1॥ हो का प्राणाचा ही घात । परि हा न सोडीं अनंत ॥ध्रु.॥ जन्मोजन्मीं हा चि धंदा । संतसंग राहो सदा ॥2॥ तुका ह्मणे भाव । तो हा जाणा पंढरिराव ॥3॥ 4368 हरीविण जिणें व्यर्थ चि संसारीं । प्रेत अळंकारीं मिरवत ॥1॥ देवाविण शब्द व्यर्थ चि कारण । भांड रंजवण सभेसि गा ॥ध्रु.॥ आचार करणें देवाविण जो गा । सर्पाचिया अंगा मृदुपण ॥2॥ तुका ह्मणे काय बहु बोलों फार । भHीविण नर अभाग्य कीं ॥3॥ 4369 जालासि पंडित पुराण सांगसी । परि तूं नेणसी मीं हें कोण ॥1॥ गाढवभरी पोथ्या उलथिशी पानें । परि गुरुगम्यखुणे नेणशी बापा ॥2॥ तुका कुणबियाचा नेणे शास्त्रमत । एक पंढरीनाथ विसंबेना ॥3॥ 4370 स्वप्नींच्या व्यवहारा काळांतर लेखा । जागृतीसि रुका गांठ नाहीं ॥1॥ तेवीं शब्दYाानें करिती चावटी । Yाान पोटासाटीं विकों नये ॥ध्रु.॥ बोलाची च कढी बोलाचा ची भात । जेवूनियां तृप्त कोण जाला ॥2॥ कागदीं लिहिली नांवाची साकर। चाटितां मधुर केवीं लागे ॥3॥ तुका ह्मणे जळो जळो त्याचें Yाान। यमपुरी कोण दंड साहे ॥4॥ 4371 भूत नावरे कोणासी । पुंडलीकें खििळलें त्यासी॥1॥ समचरण असे विटे । कटिकर उभें नीट ॥ध्रु.॥ वाळुवंटीं नाचती संत । प्रेमामृतें डुल्लत ॥2॥ तुका ह्मणे पुंडलीका । भिHबळें तूं चि निका ॥3॥ 4372 आपुले वरदळ नेदा । एवढी गोविंदा कृपणता ॥1॥ यावर बा तुमचा मोळा । हा गोपाळा कळेना ॥ध्रु.॥ सेवा तरी घेतां सांग । चोरिलें अंग सहावेना ॥2॥ तुका जरी क्रियानष्ट । तरी कां कष्ट घेतसां ॥3॥ 4373 भीमातिरींचा नाटक । यानें लावियेलें चेटक ॥1॥ मन बुिद्ध जाली ठक । नेणे संसाराची टुक ॥ध्रु.॥ कैशी प्रसंगीक वाणी । प्रत्यादर कडसणी ॥2॥ तुका ह्मणे मोठा ठक । जेथें तेथें उभा ठाके ॥3॥ 4374 कां रे दाटोन होतां वेडे । देव आहे तुह्मांपुढें ॥1॥ ज्यास पाठ नाहीं पोट । करी त्रैलोक्याचा घोंट ॥ध्रु.॥ तुमची तुह्मां नाहीं सोय । कोणाचें काय जाय ॥2॥ तुका गातो नामीं । तेथें नाहीं आह्मी तुह्मी ॥3॥ 4375 नव्हे हें कवित्व टांकसाळी नाणें । घेती भले जन भले लोक ॥1॥ लागलासे झरा पूर्ण नवनीतें । सेविलियां हित फार होय ॥2॥ तुका ह्मणे देवा केला बलात्कार । अंगा आलें फार महंतपण ॥3॥ 4376 सांवळें सुंदर पाहे दृिष्टभरि । ऐसें कांहीं करीं मन माझें ॥1॥ मना तुज ठाव दिला त्याचे पायीं । राहें विठाबाइऩसवें सदा ॥ध्रु.॥ मना नको धरूं आणिकांचा संग । नाहीं पांडुरंग जयां मनीं ॥2॥ वरपंग भाव नको ह्मणे तुका । करीं प्राणसखा नारायणा॥3॥ 4377 एकली वना चालली राना । चोरुनि जना घराचारी॥1॥ कोणी नाहीं संगीसवें । देहभावें उदास ॥ध्रु.॥ जाउनि पडे दुर्घटवनीं। श्वापदांनीं वेढिली ॥2॥ मार्ग न चले जातां पुढें । भय गाढें उदेलें॥3॥ मागील मागें अंतरलीं । पुढील चाली खोळंबा ॥4॥ तुका ह्मणे चित्तीं यासि । हृदयस्थासी आपुल्या ॥5॥ 4378 पडली घोर रजनी । संगी कोणी नसे चि ॥1॥ पहा हो कैसें चालविलें । पिसें गोवलें लावूनि ॥ध्रु.॥ कोठें लपविलें तें अंग । होता संग दिला तो ॥ ।2॥ मज कधीं नव्हतें ठावें । दोही भावें वाटोळें ॥3॥ तुका ह्मणे कैंची उरी । दोहीपरि नाडिलें ॥4॥ 4379 उदार कृपाळ पतितपावन । िब्रदें नारायणा जाती वांयां ॥1॥ वणिऩलासि श्रुति नेणे तुझा पार । राहे मौनाकार नेति ऐसें ॥ध्रु.॥ तेथें माझा धांवा पावे कोणीकडे । अदृष्ट हें पुढें वोडवलें ॥2॥ कोण ऐसा भH लाधला भाग्यासी । आठवण ऐसी द्यावी तुज ॥3॥ तुका ह्मणे नको पाहों माझा अंत । जाणोनि हे मात उडी घालीं ॥4॥ 4380 ज्याचें जैसें भावी मन । त्यासि देणें दरुषण ॥1॥ पुरवूं जाणे मनिंची खूण । समाधान करोनि ॥ध्रु.॥ आपणियातें प्रगट करी । छाया वरी कृपेची ॥2॥ तुका ह्मणे केले दान । मन उन्मन हरिनामीं ॥3॥ 4381 कां रे पुंडएा मातलासी । उभें केलें विठ्ठलासि ॥1॥ विस्त क्षीरसागरवासीं । आला उभा पंढरीसि ॥ध्रु.॥ भHी देखोनि निकट । देवें सोडिलें वैकुंठ ॥2॥ तुका ह्मणे बळी । तूं चि एक भूमंडळीं ॥3॥ 4382 शेवटींची विनंती । ऐका ऐका कमळापती ॥1॥ काया वाचा मन । चरणीं असे समर्पण ॥ध्रु.॥ जीवपरमात्मा ऐक्यासि। सदा वसो हृदयेंसीं ॥2॥ तुका ह्मणे देवा । कंठीं वसावें केशवा॥3॥ 4383 माझें परिसावें गा†हाणें । चित्त द्यावें नारायणें ॥1॥ माझे हृदयींचें वर्म । देवा जाणशी तूं कर्म ॥ध्रु.॥ सबाहएअंतरसाक्ष। ऐसा वेदीं केला पक्ष ॥2॥ तुका ह्मणे नेणां । काय सांगों नारायणा॥3॥ 4384 गुरुचिया मुखें होइल ब्रह्मYाान । न कळे प्रेमखुण विठोबाची ॥1॥ वेदातें विचारा पुराणातें पुसा । विठोबाचा कैसा प्रेमभाव ॥2॥ तुका ह्मणे सांडा जाणिवेचा शीण । विठोबाची खूण जाणती संत ॥3॥ 4385 देव आतां आह्मीं केला असे ॠणी । आणिका वांचूनि काय गुंता ॥1॥ एकाचें आर्जव करू एकनिष्ठ । आणिकांचा बोभाट कामा नये ॥ध्रु.॥ बहुतांचे आर्जव केलिया खटपट । नाहीं हा शेवट शुद्ध होत ॥2॥ पुरता विचार आणोनी मानसीं । अंतरलों सर्वासि पइप देखा ॥3॥ तुका ह्मणे देवा चरणीं असो भाव । तेणें माझा जीव संतोष हा ॥4॥ 4386 पापाची वासना नको दावूं डोळां । त्याहुनि अंधळा बराच मी ॥1॥ निंदेचें श्रवण नको माझे कानीं । बधिर करोनि ठेवीं देवा ॥ध्रु.॥ अपवित्र वाणी नको माझ्या मुखा । त्याजहुनि मुका बराच मी ॥2॥ नको मज कधीं परस्त्रीसंगति । जनांतुन माती उठतां भली ॥3॥ तुका ह्मणे मज अवघ्याचा कांटाळा । तूं एक गोपाळा आवडसी ॥4॥ 4387 कीर्त्तनाचा विकरा मातेचें गमन । भाड खाइऩ धन विटाळ तो ॥1॥ हरिभHाचि माता हे हरिगुणकीिर्त्त । इजवर पोट भरिती चांडाळ ते ॥ध्रु.॥ अंत्यज हा ऐसें कल्पांतीं करीना । भाड हे खाइऩना जननीची ॥2॥ तुका ह्मणे त्याचें दर्शन ही खोटें । पूर्वजांसि नेटें नरका धाडी ॥3॥ 4388 पंढरी पावन जालें माझें मन । आतां करूं ध्यान विठोबाचें ॥1॥ आतां ऐसें करूं नाम गाऊं गीतीं । सुखाचा सांगाती विठो करूं ॥ध्रु.॥ संग करूं त्याचा तो सखा आमचा । अनंतां जन्मांचा मायबाप ॥2॥ परतोनि सोइऩ धरीं कां रे मना । विठ्ठलचरणा घालीं मिठी ॥3॥ घातलीसे मिठी नाही भिHभाव । उदार पंढरिराव तुका ह्मणे ॥4॥ 4389 येइप गे विठ्ठले विश्वजीवनकले । सुंदर घननीळे पांडुरंगें ॥1॥ येइप गे विठ्ठले करुणाकल्लोळे । जीव कळवळे भेटावया ॥ध्रु.॥ न लगती गोड आणीक उत्तरें । तुझें प्रेम झुरे भेटावया ॥2॥ तुका ह्मणे धांव घालीं कृष्णाबाइऩ । क्षेम चाहूंबाही देइप मज ॥3॥ 4390 कटावरी कर कासया ठेविले । जननी विठ्ठले जीवलगे॥1॥ शंखचक्रगदाकमळमंडित । आयुधें मंडित कृष्णाबाइऩ॥ध्रु.॥ क्षण एक धीर होत नाहीं चित्ता । केव्हां पंढरिनाथा भेटशील ॥2॥ तुका ह्मणे हें चि करीं देइप । तइप च विश्रामा पावइऩन॥3॥ 4391 आतां मोकलावें नव्हे हें उचित । तरी कृपावंत ह्मणवावें ॥1॥ पूवाअ भH जाले सर्व आपंगिले । नाहीं उपेिक्षले तुह्मीं कोणी ॥ध्रु.॥ माझिया वेळेसि कां गा लपालासी । विश्व पोसितोसि लपोनियां ॥2॥ करावी ह्मणावी सर्वां भूतीं दया । तरी भेटावया येइऩन मी ॥3॥ तरी माझे हाती देइप मनबुिद्ध । जरि दयानिधि येशील तूं ॥4॥ तुका ह्मणे तूं चि अवघा सूत्रधारी । माझी सत्ता हरी काय आहे ॥5॥ 4392 माझें कोण आहे तुजविण देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥1॥ वाट पाहतसें कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा॥ध्रु.॥ साच करीं हरी आपुली िब्रदावळी । कृपेनें सांभाळीं महाराजा ॥2॥ क्षमा करीं सर्व अपराध माझा । लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥3॥ साहए होसी तरी जाती साही वैरी । मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥4॥ कृपा करोनि देइप दया क्षमा शांती । तेणें तुझी भिH लाभइऩल ॥5॥ माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा । जरी कांहीं करुणा येइल तुज ॥6॥ तुका ह्मणे मज कैसें आपंगा जी । आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥7॥ 4393 अपराध जाले जरी असंख्यात । तरी कृपावंत नाम तुझें ॥1॥ तुझें लडिवाळ तुज कृपा यावी । म्यां वाट पाहावी कवणाची ॥ध्रु.॥ मायबाप माझा रुक्मादेवीवर । हा दृढ निर्धार अंतरींचा ॥2॥ तुका ह्मणे कोणे गोष्टीचें संकष्ट । न घालीं मज भेट नारायणा ॥3॥ 4394 आधीं कां मज लावियेली सवे । आतां न राहावे तुजविण ॥1॥ पहिलें चि तोंडक कां गा नाहीं केलें । आतां उपेिक्षलें न सोडीं मी ॥ध्रु.॥ कृपेच्या सागरा न पाहें निर्वाण । जालों तुजवीण कासावीस ॥2॥ तुका ह्मणे कोठें गुंतलेति हरी । येइप झडकरी पांडुरंगा ॥3॥ 4395 बा रे पांडुरंगा केव्हां येशी भेटी । जाहालों हिंपुटी तुजवीण ॥1॥ तुजवीण सखें न वटे मज कोणी । वाटतें चरणीं घालूं मिठीं ॥ध्रु.॥ ओवाळावी काया चरणांवरोनि । केव्हां चक्रपाणी भेटशील ॥2॥ तुका ह्मणे माझी पुरवीं आवडी । वेगीं घालीं उडी नारायणा ॥3॥ 4396 पंचािग्नसाधन करूं धूम्रपान । काय तीर्थाटण करूं सांग ॥1॥ सांग कोणे देशीं आहे तुझें गांव । घेऊनियां धांव येऊं तेथें ॥ध्रु.॥ सांग कांहीं वृत्त कोण करूं व्रत । जेणें कृपावंत होशील तूं ॥2॥ वाटतें सेवटीं जालासि निष्ठ‍ । न देसी उत्तर तुका ह्मणे ॥3॥ 4397 तुजवीण तीळभरी रिता ठाव । नाहीं ऐसें विश्व बोलतसे ॥1॥ बोलियेले योगी मुनी साधु संत । आहेसि या आंत सर्वांठायीं ॥ध्रु.॥ मी तया विश्वासें आलों शरणागत । पूवाअचें अपत्य आहें तुझें ॥2॥ अनंत ब्रह्मांडें भरोनि उरलासि । मजला जालासि कोठें नाहीं ॥3॥ अंतपार नाहीं माझिया रूपासि । काय सेवकासि भेट देऊं ॥4॥ ऐसें विचारिलें ह्मणोनि न येशी । सांग हृषीकेशी मायबापा ॥5॥ तुका ह्मणे काय करावा उपाय । जेणें तुझे पाय आतुडति ॥6॥ 4398 काम क्रोध आड पडले पर्वत । राहिला अनंत पलीकडे ॥1॥ नुलंघवे मज न सांपडे वाट । दुस्तर हा घाट वैरियांचा ॥ध्रु.॥ आतां कैंचा मज सखा नारायण । गेला अंतरोन पांडुरंगा ॥2॥ तुका ह्मणे व्यर्थ मोलाचें शरीर । गेलें हा विचार कळों आला ॥3॥ 4399 नव्हे निष्ठावंत तुज काय बोल । सेवेविण मोल मागतसें ॥ध्रु.॥ न घडे भजन शुद्ध भावनिष्ठा । आपुल्या अदृष्टावरी बोल ॥ध्रु.॥ पूवाअ जाले भH असंख्य विरH । काम क्रोध अहंते निदाऩिळलें ॥2॥ ऐसी अंगवण नाहीं मज देवा । करीतसें हेवा भेटावयाचा ॥3॥ कृपा करोनियां पुरवीं असोसी । आपुल्या िब्रदासी राखावया ॥4॥ तुका ह्मणे एक बाळक अYाातें । त्यासि हे पोसित मायबापें ॥5॥ नाटाचे 2 4400 अगा ये मधुसूदना माधवा । अगा ये कमळापती यादवा । अगा श्रीधरा केशवा । अगा बांधवा द्रौपदीच्या ॥1॥ अगा विश्वव्यापका जनादऩना । गोकुळवासी गोपिकारमणा । अगा गुणनिधि गुणनिधाना । अगा मदऩना कंसाचिया ॥ध्रु.॥ अगा सवाौत्तमा सर्वेश्वरा । गुणातीता विश्वंभरा । अगा निर्गुणा निराकारा । अगा आधारा दीनाचिया ॥2॥ अगा उपमन्यसहाकारा । अगा शयना फणिवरा । अगा काळकृतांत असुरा । अगा अपारा अलक्षा ॥3॥ अगा वैकुंठनिवासा । अगा अयोध्यापति राजहंसा । अगा ये पंढरिनिवासा। अगा सर्वेशा सहजरूपा ॥4॥ अगा परमात्मा परमपुरुषा। अगा अव्यया जगदीशा । अगा कृपाळुवा आपुल्या दासा । तोडीं भवपाशा तुका ह्मणे ॥5॥ 4401 कैसी करूं तुझी सेवा । ऐसें सांगावें जी देवा । कैसा आणूं अनुभवा । होशी ठावा कैशापरी ॥1॥ कर्मभ्रष्ट माझें मन । नेणें जप तप अनुष्ठान । नाहीं इंिद्रयांसि दमन । नव्हे मन एकविध॥ध्रु.॥ नेणे यातीचा आचार । नेणें भHीचा विचार । मज नाहीं संतांचा आधार । नाहीं िस्थर बुिद्ध माझी ॥2॥ न सुटे मायाजाळ । नाहीं वैराग्याचें बळ । न जिंकवती सबळ । काम क्रोध शरीरीं ॥3॥ आतां राख कैसें तरि । मज नुपेक्षावें हरी । तुझीं िब्रदें चराचरीं । तैसीं साच करीं तुका ह्मणे ॥4॥ 4402 भीमातीरवासी । तेथें निश्चयेंसी काशी ॥1॥ मुख्यमुHीचें माहेर । ऐसें जाणा पंढरपुर ॥ध्रु.॥ घडे भींवरेशीं स्नान । त्यासि पुन्हा नाहीं जन्म ॥2॥ भाव धरोनि नेटका । मोक्ष जवळी ह्मणे तुका ॥3॥ 4403 जाली गाढवी दुधाळ । महिमा गाइऩची पावेल ॥1॥ श्वान जालेंसे चांगलें । तरी कां सांगातें जेवील ॥ध्रु.॥ जाली सिंदळा चांगली । तरि कां पतिव्रता जाली ॥2॥ तुका ह्मणे ऐशा जाति । काय उंचपण पावती ॥3॥ 4404 काशीयात्रा पांच द्वारकेच्या तीन । पंढरीची जाण एक यात्रा ॥1॥ काशी देह विटंबणें द्वारकें जाळणें । पंढरीशी होणें ब्रह्मरूप ॥ध्रु.॥ अठरापगडयाती सकळ हि वैष्णव । दुजा नाहीं भाव पंढरीसि ॥2॥ तुका ह्मणे असो अथवा नसो भाव । दर्शनें पंढरिराव मोक्ष देतो ॥3॥ 4405 हें चि मागणें विठाबाइऩ । पायीं ठेवूनियां डोइऩ ॥1॥ शांति दया अंतःकरणीं । रंगो रामनामीं वाणी ॥ध्रु.॥ मूळ द्वंद्वाचें विघडो । निजानंदीं वृित्त जडो ॥2॥ तुका ह्मणे हरी । आतां आपुलेंसें करीं ॥3॥ 4406 करोनि स्नानविधि आणि देवधर्म । क्रिया नित्यनेम तुजसाटीं ॥1॥ तुजलागीं दानें तुजलागीं तीथॉ । सकळ ही व्रतें तुजलागीं ॥ध्रु.॥ सकळ चित्तवृित्त दिवस आणि राती । आवडशी प्रीती नारायणा ॥2॥ तुका ह्मणे याहो पवित्राच्या राया । प्राणविसावया पांडुरंगा ॥3॥ 4407 पहावा नयनीं विठ्ठल चि एक । कांहीं तरी सार्थक संसाराचें ॥1॥ कोठें पाहों तुज कां गा लपालासि । कांहीं बोल मशीं नारायणा ॥ध्रु.॥ वाटते उदास मज दाही दिशा । तुजविण हृषीकेशा वांचोनियां ॥2॥ नको ठेवूं मज आपणा वेगळें । बहुत कळवळें तुजलागीं ॥3॥ तुका ह्मणे भेटी देइप नारायणा । घडी कंठवेना तुजविण ॥4॥ 4408 पूवाअ बहुतांचे केले प्रतिपाळ । तें मज सकळ श्रुत आहे ॥1॥ अज अविनाश निर्गुण निरामय । विचारिलें काय त्यांचे वेळे ॥ध्रु.॥ तयांचियें वेळे होशी कृपावंत । माझा चि कां अंत पहातोसि ॥2॥ नारद प्र†हाद उपमन्य धुरू । त्यांचा अंगीकारु कैसा केला ॥3॥ अंबॠषीसाटीं गर्भवास जाले । कां गा मोकलिलें कृपासिंधु ॥4॥ धर्माचें उिच्छष्ट अर्जुनाचीं घोडीं । आणीक सांकडीं कितीएक ॥5॥ जालासि लुगडीं तया द्रौपदीचीं । न ये कां आमुची कृपा कांहीं ॥6॥ तुका ह्मणे कां गा जालासि कठीण । माझा भाग सीण कोण जाणे ॥7॥ 4409 कासयासि व्यर्थ घातलें संसारीं । होतें तैसें जरी तुझे चित्तीं ॥1॥ तुझिये भेटीची थोर असे आस । दिसोनी निरास आली मज ॥ध्रु.॥ आतां काय जिणें जालें निरर्थक । वैकुंठनायक भेटे चि ना ॥2॥ आडलासि काय कृपेच्या सागरा । रकुमादेवीवरा सोइरिया॥3॥ तुका ह्मणे देइप चरणाची सेवा । नुपेक्षीं केशवा मायबापा ॥4॥ 4410 पक्षीयाचे घरीं नाहीं सामुगरी । त्यांची चिंता करी नारायण ॥1॥ अजगर जनावर वारुळांत राहे । त्याजकडे पाहे पांडुरंग ॥ध्रु.॥ चातक हा पक्षी नेघे भूमिजळ । त्यासाटीं घननीळ नित्य वर्षे ॥2॥ तुका ह्मणे आह्मी पिप्पलिकांची जात । पुरवीं मनोरथ पांडुरंगा ॥3॥ 4411 रामनाम हा चि मांडिला दुकान । आहे वानोवाण घ्यारे कोणी ॥1॥ नका कोणी करूं घेता रे आळस । वांटितों तुह्मांस फुकाचें हें ॥ध्रु.॥ संचितासारिखे पडे त्याच्या हाता । फारसें मागतां तरी न ये ॥2॥ तुका ह्मणे आह्मीं सांठविलें सार । उरलिया थार विचारितां ॥3॥ 4412 बहुजन्मां शेवटीं स्वामी तुझी भेटी । बहु मोह पोटीं थोर जाला ॥1॥ बहु पुरें पाहिलीं बहु दिशा शोधिली । बहु चिंता वाहिली दुर्भराची ॥ध्रु.॥ बहु काळ गेले अनुचित केलें । बहु नाहीं गाइलें नाम तुझें ॥2॥ ऐसा मी अपराधी अगा कृपानिधि । बहु संतां संनिधि ठेवीं तुका ॥3॥ 4413 कोण उपाव करूं भेटावया । जाळावी हे काया ऐसें वाटे ॥1॥ सोडोनियां गांव जाऊं वनांतरा । रुकुमादेवीवरा पहावया॥ध्रु.॥ करूं उपवास शोधूं हें शरीर । न धरवे धीर नारायणा॥2॥ जाती आयुष्याचे दिवस हे चारी । मग केव्हां हरी भेटशील ॥3॥ तुका ह्मणे कांहीं सांगा विचारोनि । विठो तुझे मनीं असेल तें ॥4॥ 4414 माय बाप बंधु सोयरा सांगाती । तूं चि माझी प्रीति गण गोत ॥1॥ शरण आलीं त्यांचीं वारिलीं दुरितें । तारिले पतित असंख्यात ॥ध्रु.॥ इतर कोण जाणे पावलें विश्रांति । न येतां तुजप्रति शरणागत ॥2॥ तयामध्यें मज ठेवीं नारायणा । लक्षुमीरमणा सोइरिया ॥3॥ तुका ह्मणे देइप दर्शनाचा लाभ । जे पाय दुर्लभ ब्रह्मादिकां ॥4॥ 4415 पाप ताप माझे गुणदोष निवारीं । कृष्णा विष्णु हरी नारायणा ॥1॥ काम क्रोध वैरी घालोनि बाहेरी । तूं राहें अंतरीं पांडुरंगा ॥ध्रु.॥ करिशील तरी नव्हे कांइ एक । निमिऩलें jयैलोक्य हेळामात्रें ॥2॥ समर्थासि काय आह्मीं शिकवावें । तुका ह्मणे यावें पांडुरंगा ॥3॥ 4416 ये गा महाविष्णु अनंतभुजाच्या । आह्मां अनाथांच्या माहेरा ये ॥1॥ भेटावया तुज ओढे माझा जीव । एकवेळा पाय दावीं डोळां ॥ध्रु.॥ आणीक हे आर्त नाहीं नारायणा । ओढे हे वासना भेटावया ॥2॥ वाटे चित्तीं काय करावा विचार । चरण सुंदर पहावया ॥3॥ तुका ह्मणे माझे पुरवीं मनोरथ । येइऩ गा न संवरीत पांडुरंगा ॥4॥ 4417 काय पाहतोसि कृपेच्या सागरा । नराच्या नरेंद्रा पांडुरंगा ॥1॥ नामाचा प्रताप िब्रदाचा बडिवार । करावा साचार नारायणा ॥ध्रु.॥ कलीमाजी देव बौध्यरूप जाला । जगाचिया बोला लागूं नका ॥2॥ माय पुत्रा काय मारूं पाहे कळी । जगाची ढवाळी काय काज ॥3॥ तुका ह्मणे या हो कृपेच्या सागरा । रुकुमादेवीवरा मायबापा ॥4॥ 4418 रामनामाचे पवाडे । अखंड ज्याची वाचा पढे ॥1॥ धन्य तो एक संसारीं । रामनाम जो उच्चारी ॥ध्रु.॥ रामनाम गर्जे वाचा । काळ आYााधारक त्याचा ॥ 2 ॥ तुका ह्मणे रामनामीं । कृतकृत्य जालों आह्मीं ॥3॥ 4419 येइल घरा देव न धरीं संदेहा । फकिराचा यावा व्हावा जेव्हां ॥1॥ होइल फकीर योगी महानुभाव । घडीघडी देव सांभाळील ॥2॥ तुका ह्मणे ऐसें बोलती बहुत । येणे गुणें संत जाले राम ॥3॥ 4420 भHीवीण जिणें जळो लाजिरवाणें । संसार भोगणें दुःखमूळ ॥1॥ वीसलक्ष योनि वृक्षामाजी घ्याव्या । जलचरीं भोगाव्या नवलक्ष ॥ध्रु.॥ अकरालक्ष योनि किडएांमाजी घ्याव्या । दशलक्ष भोगाव्या पIयांमध्ये ॥2॥ तीसलक्ष योनि पशूंचीये घरीं । मानवाभीतरीं चारलक्ष ॥3॥ एकएक योनि कोटिकोटि फेरा । मनुष्यदेहाचा वारा मग लागे ॥4॥ तुका ह्मणे तेव्हां नरदेह नरा । तयाचा मातेरा केला मूढें ॥5॥ 4421 तुजवांचून कोणा शरण । जाऊं आतां कर जोडून॥1॥ कोण करील माझें साहे । चित्तीं विचारूनि पाहें ॥ध्रु.॥ तूं तंव कृपेचा सागर । दीनबंधु जगदोद्धार ॥2॥ तुका ह्मणे निका । भवसिंधु तारक नौका ॥3॥ 4422 हातीं धरिलियाची लाज । देवा असोंदे गा तुज॥1॥ आहें अमंगळ दुर्बळ । होइप दीन तूं दयाळ ॥ध्रु.॥ बाळ सेंबडें मातेसि । काय नावडे तियेसि ॥2॥ तुका ह्मणे जाणें । करोनि देहाचें सांडणें ॥3॥ 4423 जळोजळो तें गुरुपण । जळोजळो तें चेलेपण ॥1॥ गुरु आला वेशीद्वारीं । शिष्य पळतों खिंडोरीं ॥ध्रु.॥ काशासाटीं जालें येणें । त्याचें आलें वर्षासन ॥2॥ तुका ह्मणे चेला । गुरू दोघे हि नरकाला ॥3॥ 4424 अगा पंढरीच्या राया । वेगीं येइप तूं सावया ॥1॥ दीनबंधु तुझें नाम । देइप आपुलें आह्मां प्रेम ॥ध्रु.॥ जीवनकळा तूं विश्वाची । तूं चि माउली अनाथाची ॥2॥ तुका ह्मणे पुंडलिका । ठेवीं मस्तकीं पादुका ॥3॥ 4425 विटेवरी समचरण । तो हा रुिक्मणीरमण ॥1॥ वेदशास्त्रा माहेर । केले दासा उपकार ॥ध्रु.॥ नामापाशीं चारी मुिH। पहा हृदयीं प्रतीति ॥2॥ तुका ह्मणे कळा । अंगीं जयाच्या सकळा ॥3॥ 4426 सकळ हे माया नागवे कवणा । भांबाविलें जना दाही दिशा ॥1॥ आशा तृष्णा दंभ लागलीं हीं पाठी । नेदी बैसों हाटीं मोह ठायीं ॥ध्रु.॥ काम क्रोध घरा लावितील आगी । निंदा हिंसा दोघी पळतां खाती ॥2॥ लाज पुढें उभी राहिली आडवी । ते करी गाढवी थोर घात ॥3॥ तुका ह्मणे चिंता घाली गर्भवासीं । ओढोनियां पाशीं चहूंकडे ॥4॥ 4427 सकळतीर्थाहुनि । पंढरी हें मुगुटमणि ॥1॥ काय सांगों तेथिल शोभा । रमावल्लभ जेथें उभा ॥ध्रु.॥ न लभे व्रततीर्थदानीं। तें या विठ्ठलदर्शनीं ॥2॥ साधु संत गाती नाम । सकळ भूतांचा विश्राम ॥3॥ तुका ह्मणे स्तुती । करूं काय सांगों किती ॥4॥ 4428 गव्हांच्या घुग†या । नाचण्यांच्या पु†या । ब†या त्या चि ब†या । पाधाणी त्या पाधाणी ॥1॥ काय थोरपण । वांयां जाळावा तो शीण । कारणापें भिन्न । निवडे तें निराळें ॥ध्रु.॥ रुचि वोजेपाशी । गरज ते जैशीतैशी । करूं नका नाशी । खावें खाणें जालें तें ॥2॥ तुका ह्मणे मोठा । काय करावा तो ताटा । नाहीं वीण निटा । पाविजेत मारग ॥3॥ 4429 आपुलिया ऐसें करी । संग धरी ज्याचा हो ॥1 ॥ ह्मणउनि परपरते । वरवरते पळतसें ॥ध्रु.॥ लोभिक तें लोभा लावी। बांधल्या गोवी वांचूनि ॥2॥ तुका ह्मणे नामगोठी । पुरे भेटी तुझी देवा ॥3॥ 4430 बरें जालीयाचे अवघें सांगाती । वाइटाचे अंतीं कोणी नाहीं ॥1॥ नोहे मातापिता नोहे कांतासुत । इतरांची मात काय सांगों ॥2॥ तुका ह्मणे जन दुतोंडी सावज । सांपडे सहज तिकडे धरी ॥3॥ 4431 मिथ्या आहे सर्व अवघें हें मायिक । न कळे विवेक मज कांहीं ॥1॥ सर्व बाजागिरी वाटती ही खरी । पहातां येथें उरी कांहीं नाहीं ॥ध्रु.॥ आतां मज दुःख वाटतें अंतरीं । उपाय झडकरी सांग कांहीं ॥2॥ पुढें कोण गति न कळे सर्वथा । तुझे पायीं माथा ठेवियेला ॥3॥ करणें तें करीं सुखें आतां हरी । तुज म्यां निर्धारीं धरियेलें ॥4॥ स्वहित तें काय न कळे सर्वथा । तारीं तूं अनंता तुका ह्मणे ॥5॥ 4432 अवघ्या कोल्हएांचें वर्म अंडीं । धरितां तोंडीं खीळ पडे ॥1॥ भुंकुं नका भुंकुं नका । आला तुका विष्णुदास ॥ध्रु.॥ कवणे ठायीं सादर व्हावें । नाहीं ठावें गाढवा ॥2॥ दुर्जनासि पंचानन । तुका रजरेणु संतांचा ॥3॥ 4433 तुझे ह्मणों आह्मां । मग उणें पुरुषोत्तमा ॥1॥ ऐसा धर्म काय । अमृतानें मृत्यु होय ॥ध्रु.॥ कल्पवृक्षा तळीं । गांठी बांधलिया झोळी ॥2॥ तुका ह्मणे परीस । सांपडल्या उपवास॥3॥ 4434 कोरडिया गोष्टी नावडती मना । नाहीं ब्रह्मYाानाविण चाड ॥1॥ दाखवीं आपुलें सगुण रूपडें । वंदीन मी कोडें पाय तुझे ॥ध्रु.॥ न लगे तो मोक्ष मज सायुज्यता । नावडे हे वार्ता शून्याकारी ॥2॥ तुका ह्मणे चाड धरीन श्रीमुखें । येशिल कवतुकें जवळीक ॥3॥ 4435 गणेश सारजा करिती गायना । आणि देवांगना रंभे ऐशा ॥1॥ तेथें आह्मीं मानवांहीं विनवावें तें काय । सुरवर पाय वंदिति जेथें ॥ध्रु.॥ ज्याच्या गायनासी तटस्थ शंकर । त्या हि परि पार न कळे तुझा ॥2॥ तुका ह्मणे आह्मी किंकर ते किती । इंद्राची हि मति नागविशी ॥3॥ 4436 डोिळयांचें दैव आजि उभें ठेलें । निधान देखिलें पंढरीये ॥1॥ काय ते वानावें वाचेचे पालवें । वेदा न बोलवे रूप ज्याचें ॥ध्रु.॥ आनंदाच्या रसें ओंतीव चांगलें । देखतां रंगलें चित्त माझें ॥2॥ तुका ह्मणे मी तों सगळाच विरालों । विठ्ठल चि जालों दर्शनानें ॥3॥ 4437 भोगियेल्या नारी । परि तो बाळब्रह्मचारी ॥1॥ ऐसी ज्याचें अंगीं कळा । पार न कळे वेदाला ॥ध्रु.॥ वळीवळी थोरथोर। मोडोनियां केले चूर ॥2॥ वांकडी कुबज्या । सरसी आणियेली वोजा ॥3॥ मल्ल रगडिला पायीं । गज झुगारिला बाहीं ॥4॥ जिवें मारियेला मामा । धांवें भHाचिया कामा ॥5॥ तुका ह्मणे पूर्ण । दावी भHीचीं विंदानें ॥6॥ 4338 वृद्धपणीं आली जरा । शरीर कांपे थरथरा ॥1॥ आयुष्य गेलें हें कळेना । स्मरा वेगीं पंढरिराणा ॥ध्रु.॥ दांत दाढा पडिल्या ओस । हनुवटि भेटे नाकास ॥2॥ हात पाय राहिलें कान। नेत्रा पाझर हाले मान ॥3॥ अंगकांति परतली । चिरगुटा ऐसी जाली ॥4॥ आड पडे जिव्हा लोटे । शब्द नये मुखा वाटे॥5॥ लांब लोंबताती अंड । भरभरा वाजे गांड ॥6॥ तुका ह्मणे आतां तरी । स्मरा वेगीं हरी हरी ॥7॥ 4439 वृद्धपणी न पुसे कोणी । विटंबणी देहाची ॥1॥ नव द्वारें जाली मोकळीक । गांड सरली वाजती ॥ध्रु.॥ दंत दाढा गळे थुंका । लागे नाका हनुवटी ॥2॥ शब्द नये मुखावाटा । करिती चेष्टा पोरें ती ॥3॥ तुका ह्मणे अजूनि तरी । स्मरें श्रीहरी सोडवील ॥4॥ 4440 अतित्याइऩ देतां जीव । नये कींव देवासि ॥1॥ थोडएासाटीं राग आला । जीव दिला गंगेंत ॥ध्रु.॥ त्यासि परलोकीं नाहीं मुिH । अधोगति चुकेना ॥2॥ तुका ह्मणे कृष्णराम । स्मरतां श्रम वारती ॥3॥ 4441 तुझें रूप पाहतां देवा । सुख जालें माझ्या जीवा॥1॥ हें तों वाचे बोलवेना । काय सांगों नारायणा ॥ध्रु.॥ जन्मोजन्मींचे सुकृत । तुझे पायीं रमे चित्त ॥2॥ जरी योगाचा अभ्यास । तेव्हां तुझा निजध्यास ॥3॥ तुका ह्मणे भH । गोड गाऊं हरिचें गीत॥4॥ 4442 तुजवीण मज कोण आहे देवा । मुकुंदा केशवा नारायणा ॥1॥ जोडोनियां कर कृपेच्या सागरा । गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥ साच करीं हरी आपुली िब्रदावळी । कृपेनें सांभाळीं मायबापा ॥2॥ साहए होसी जरी जाती सहा वैरी । मग ध्यान करीं आवडीनें ॥3॥ सर्व अपराध क्षमा करीं माझा । लडिवाळ तुझा पांडुरंगा ॥4॥ कृपा करोनियां द्यावी क्षमा शांति । तेणें तुझी भिH घडेल देवा ॥5॥ ऐंसें तों सामर्थ्य नाहीं नारायणा । जरी तुज करुणा येइल कांहीं ॥6॥ तुका ह्मणे आतां आपंगावें मज । राखें माझी लाज पांडुरंगा ॥7॥ 4443 नको विद्या वयसा आयुष्य फारसें । नाहीं मज पिसें मुHीचें ही ॥1॥ रामकृष्ण ह्मणतां जावो माझा प्राण । हें चि कृपादान मागतसें ॥ध्रु.॥ नको धन मान न वाढे संतान । मुखीं नारायण प्राण जावा ॥2॥ तुका ह्मणे दीन काकुलती येतों । तुज निरवितों पांडुरंगा ॥3॥ 4444 शिष्या सांगे उपदेश । गुरुपूजा हे विशेष ॥1॥ दावी आचार सोवळे । दंड कमंडलु माळे ॥ध्रु.॥ छाटी भगवी मानसीं ।व्यर्थ ह्मणवी संन्यासी ॥2॥ तुका ह्मणे लोभ । न सुटे नाहीं लाभ ॥3॥ 4445 जिकडे पाहें तिकडे उभा । अवघ्या गगनाचा गाभा॥ 1 ॥ डोळां बैसलें बैसलें । रूप राहोनि संचलें ॥ध्रु.॥ न वजिऩतां दाही दिशा । जिकडे पाहें तिकडे सरिसा ॥2॥ तुका ह्मणे समपदीं । उभा दिठीचिये आधीं ॥3॥ 4446 आपटा संवदड रानचारा । दस†याचा होय तुरा॥1॥ तैसा देवामुळें मान । नाहीं तरी पुसें कोण ॥ध्रु.॥ मृित्तकेची ते घागरी । पाण्यासाटीं बैसे शिरी ॥2॥ तुका ह्मणे माप जाण । दाण्यासवें घेणें देणें ॥3॥ 4447 काळ सार्थक केला त्यांणी । धरिला मनीं विठ्ठल॥1॥ नाम वाचे श्रवण कीिर्त्त । पाउलें चित्तीं समान ॥ध्रु.॥ कीर्त्तनाचा समारंभ । निदपभ सर्वदा ॥2॥ तुका ह्मणे स्वरूपसििद्ध । नित्य समाधि हरिनामीं ॥3॥ 4448 आह्मी जातों आपुल्या गांवा । आमुचा रामराम घ्यावा ॥1॥ तुमची आमची हे चि भेटी । येथुनियां जन्मतुटी॥ध्रु.॥ आतां असों द्यावी दया । तुमच्या लागतसें पायां ॥2॥ येतां निजधामीं कोणी । विठ्ठलविठ्ठल बोला वाणी ॥3॥ रामकृष्ण मुखीं बोला । तुका जातो वैकुंठाला ॥4॥ 4449 कामधेनूचें वासरूं । खाया न मिळे काय करूं ॥1॥ ऐसें आह्मां मांडियेलें । विठो त्वां कां सांडियेलें ॥ध्रु.॥ बैसोनि कल्पद्रुमातळीं । पोटासाटीं तळमळीं ॥2॥ तुका ह्मणे नारायणा । बरें लोकीं हें दीसेना ॥3॥ 4450 तुझें नाम माझे मुखी असो देवा । विनवितों राघवा दास तुझा ॥1॥ तुझ्या नामबळें तरले पतित । ह्मणोनि माझें चित्त तुझे पायीं ॥2॥ तुका ह्मणे तुझें नाम हें सादर । गातां निरंतर सुख वाटे ॥3॥ 4451 उभय भाग्यवंत तरी च समान । स्थळीं समाधान तरी च राहे ॥1॥ युHीचें गौरव नसतां जिव्हाळा । सांचवणी जळा परी नाश ॥ध्रु.॥ लोखंडा परीस Yाानिया तो शठ । नांवाचा पालट दगड खरा ॥2॥ तुका ह्मणे अवघे विनोदाचे ठाव । एकात्मक भाव नाहीं तेथें ॥3॥ 4452 दो दिवसांचा पाहुणा चालतो उताणा । कां रे नारायणा न भजसी ॥1॥ तूं अखंड दुिश्चत्ता तुज नेती अवचिता । मग पंढरीनाथा भजसी केव्हां ॥2॥ तुका ह्मणे ऐसे आहेत उदंड । तया केशव प्रचंड केवीं भेटे ॥3॥ 4453 तुझे पाय माझें भाळ । एकत्रता सर्वकाळ ॥1॥ हें चिं देइप विठाबाइऩ । पांडुरंगे माझे आइऩ ॥ध्रु.॥ नाहीं मोक्ष मुिH चाड । तुझी सेवा लागे गोड ॥2॥ सदा संग सज्जनांचा । नको वियोग पंढरीचा ॥3॥ नित्य चंद्रभागे स्नान । करीं क्षेत्रप्रदक्षण॥4॥ पुंडलीक पाहोन दृष्टी । हषॉ नाचों वाळवंटीं ॥5॥ तुका ह्मणे पांडुरंगा । तुझें स्वरूप चंद्रभागा ॥6॥ 4454 बाइऩल चालिली माहेरा । संगें दिधला ह्मातारा ॥1॥ सिधा सामग्री पोटाची । सवें स्वारी बइलाची ॥ध्रु.॥ जाता पाडिली ढोरानें । सिव्या देती अन्योविन्ये ॥2॥ न सावरी आपणातें । नग्न सावलें वरतें ॥3॥ फजित केलें जनलोकीं । मेला ह्मणे पडे नरकीं॥4॥ गोहाची हे गेली लाज । गांजितां कां तुह्मी मज ॥5॥ तुका ह्मणे जनीं । छी थू केली विटंबणी ॥6॥ 4455 तुळसीवृंदावनीं उपजला कांदा । नावडे गोविंदा कांहीं केल्या ॥1॥ तैसे वंशामध्यें जाले जे मानव । जाणावे दानव अभH ते ॥ध्रु.॥ केवडएामधील निगपध कणसें । तैशीं तीं माणसें भिHहीन ॥2॥ तुका ह्मणे जेवीं वंदनांतिल आळी । न चढे निढळीं देवाचिया ॥3॥ 4456 शिव शिH आणि सूर्य गणपति । एक चि ह्मणती विष्णूस ही ॥1॥ हिरा गार दोनी मानिती समान । राजस भजनें वांयां जाती ॥ध्रु.॥ अन्य देवतांसि देव ह्मणऊन । तामस जीवन तमोयोग्या ॥2॥ वांयां जायासाठीं केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ॥3॥ आपुलिया मुखें सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥4॥ धन्य ते वैष्णव भजती केशव । साित्वक हे जीव मोक्षा योग्य ॥5॥ तुका ह्मणे मोक्ष नाहीं कोणापासीं । एका गोविंदासी शरण व्हा रे ॥6॥ 4457 तुह्मी साधु संत कैवल्यसागर । मोक्षाचे आगर तुह्मां घरीं ॥1॥ तेथें मतिमंद काय बोलों वाणी । अमृताचे धणी पाणी कां घ्या ॥ध्रु.॥ कोटी भानु तेजीं खद्योत बापुडें । तैसा तुह्मांपुढें काय बोलों ॥2॥ तुह्मी अवघे चिंतामणि कल्पतरूचीं वनें । त्यापुढें धांवणें मषकांनीं ॥3॥ वाराणशीक्षेत्र गंगा वाहे कोड । का तेथें पाड कोकणाचे ॥4॥ पल्लवाचा वारा हिमकरीं काय । गगनावरी छाय कोण करी ॥5॥ समुद्राची तृषा हरी ऐसा कोण । जगाची जी तान्ह निववितो ॥6॥ मेरूचा पाठार अवघी ते िक्षति । मषकाचे हातीं मुिष्ट फावे ॥7॥ सिंहापुढें काय जंबूक आरोळी । मोतियांचे वोळी कांच काय ॥8॥ कापुरासि काय लावूनि उटावें । काय ओवाळावें दीपकासि ॥9॥ तैशी तुह्मी निरे Yाानाचे भरींव । तेथें म्यां बोलावें पाड काय ॥10॥ कृपानिधि तुह्मीं बोलविलें बोला । सुखें न्याय केला तुमचा मीं ॥11॥ अYाान मी वेडें ह्मणवितों बाळ । माझा प्रतिपाळ करणें तुह्मां ॥12॥ बोबडें बोलणें न धरावा कोप । क्षमा करा बाप कृपासिंधु ॥13॥ तुका ह्मणे तुह्मी संत बापमाय । भयें धरिले पाय कृपानिधि ॥14॥ 4458 देहीं असोनियां देव । वृथा फिरतो निद।व ॥1॥ देव आहे अंतर्यामीं । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामीं ॥ध्रु.॥ नाभी मृगाचे कस्तुरी। व्यर्थ हिंडे वनांतरीं ॥2॥ साखरेचें मूळ ऊंस । तैसा देहीं देव दिसे॥3॥ दुधीं असतां नवनीत । नेणे तयाचें मथित ॥4॥ तुका सांगे मूढजना । देहीं देव कां पाहाना ॥5॥ 4459 जयजय ह्मणा राम । हातें टाळी वाचे नाम ॥1॥ आटाआटी नाहीं ज्यास । न वेचे मोल न पडे खांस ॥ध्रु.॥ आपण ह्मणे आणिकां हातीं । यYाादिकीं नये ते गति ॥2॥ आसन भोजन करितां काम । ध्यानसमाधि ह्मणतां राम ॥3॥ मंत्र जपा हा चि सार। वर्णा याती जयजयकार ॥4॥ ह्मणतां राम ह्मणे तुका । वेळोवेळां चुकों नका ॥5॥ 4460 शिकवणेसाटीं वाटते तळमळ । पुढें येइऩल काळा फोडों डोइऩ ॥1॥ तेव्हां त्यासि काय देशील उत्तर । मेळउनि अंतर ठेवितोसि ॥ध्रु.॥ येथींचिया सोंगें भोरपियाचे परि । होइऩल तें दुरि शृंगारिलें ॥2॥ तुका ह्मणे कां रे राखिलें खरकटें । रागेल्याचे तंट रागेलें का ॥3॥ 4461 होइप आतां माझ्या भोगाचा भोगिता । सकळ अनंता शुभाशुभ ॥1॥ आठवुनी पाय राहिलों हृदयीं । निवारली तइप सकळ चिंता ॥ध्रु.॥ अचळ न चळे देहाचें चळण । आहे हें वळण प्रारब्धें चि ॥2॥ तुका ह्मणे जालें एक चि वचन । केलिया कीर्त्तन आराणुक ॥3॥ 4462 लेखी दुखण्यासमान । वेचला नारायणीं क्षण । उद्यांचें आजि च मरण । आणोनि ह्मणे हरि भोHा ॥1॥ नाहीं कांहीं पडों येत तुटी । जाणें तो आहे सेवटीं । लाभ विचारोनि पोटीं। होइप सेवटीं जागृत ॥ध्रु.॥ आहे ते उरे कटा । लावुनि चळ आपुला फाटा । पुरे हें न पुरे सेवटा । तरण्या बळकटा सदा वास॥2॥ ह्मणोनि मोडावा कांटाळा । अविद्यात्मक कोंवळा । होतील प्रबळा । आशा तृष्णा माया ॥3॥ क्षण या देहाच्या अंतीं। जड होउनि राहेल माती । परदेश ते परवर होती । चिळसविती नाकडोळे ॥4॥ जंव या नाहीं पातल्या विपित्त । आयुष्य भविष्य आहे हातीं । लाभ विचारोनि गुंती । तुका ह्मणे अंतीं सर्व पिसुनें॥5॥ 4463 आसावलें मन जीवनाचें ओढी । नामरूपीं गोडी लावियेली ॥1॥ काय तुझे पायीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥ध्रु.॥ काय लोखंडाचे पाहे गुणदोष । सिवोन परीस सोनें करी ॥2॥ तुका ह्मणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥3॥ 4464 पंढरीची वारी जयांचिये घरीं । पायधुळी शिरीं वंदिन त्यांची ॥1॥ दासाचा मी दास पोसणा डोंगर । आतां बहु फार काय बोलों ॥ध्रु.॥ जातीचें मी हीन न कळे भजन । ह्मणोनि संतचरण इच्छीतसें ॥2॥ तुका ह्मणे मज ह्मणावें आपुलें । बहुता तारिलें संतजनीं ॥3॥ 4465 नाम पावन पावन । त्याहून पवित्र आहे कोण ॥1॥ शिव हालाहालें तापला । तो ही नामें शीतळ जाला ॥ध्रु.॥ शिवास नामाचा आधार । केला किळकाळ किंकर ॥2॥ मरण जालें काशीपुरी। तेथें नाम चि उद्धरी ॥3॥ तुका ह्मणे अवघीं चोरें। एक हरिनाम सोइरें ॥4॥ 4466 अल्प विद्या परि गर्वशिरोमणि । मजहुनि Yाानी कोणी आहे ॥1॥ अंगीं भरे ताठा कोणासी मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥ सज्जनाच्या देहीं मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तो चि एक ॥2॥ संतांची जो निंदा करी मुखीं जप। खतेलें तें पाप वज्रलेप ॥3॥ तुका ह्मणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥4॥ 4467 नाहीं संतांशीं शरण । काय वाचोनि पुराण ॥1॥ ह्मणे विठ्ठलाचा दास । देखोनी परनारीस हांसे ॥ध्रु.॥ करिती विठोबाची भिH । दयाधर्म नाहीं चित्तीं ॥2॥ तेथें नाहीं माझा देव। व्यर्थ श्रमवी हा जीव ॥3॥ अंगीं नाहीं क्षमा दया । ह्मणती भेट पंढरीराया ॥4॥ नाहीं धर्माची वासना । काय करोनि प्रदिक्षणा॥5॥ ऐसें नव्हे भिHवर्म । तेथें नाहीं माझा राम ॥6॥ नये कृपा कांहीं केल्या । नये घाम जीव गेल्या ॥7॥ जैसी खड्गाची धार । विठ्ठलचरणीं तुका शूर ॥8॥ 4468 नाहीं रिकामीक परी वाहे मनीं । तया चक्रपाणि साहए होय ॥1॥ उद्वेग जीवासि पंढरीचें ध्यान । तया नारायण साहए करी ॥ध्रु.॥ शरीरासि बळ नाहीं स्वता भाव । तया पंढरिराव साहए करी ॥2॥ असो नसो बळ राहे पराधीन । तरी अनुमान करूं नका ॥3॥ तुका ह्मणे येणें करोनि चिंतनीं । तया नारायण जवळीक ॥4॥ 4469 दारिद्रानें विप्र पीडिला अपार । तया पोटीं पोर एक असे ॥1॥ बाहेरी मिष्टान्न मिळे एके दिशीं । घेऊनी छंदासि त्या चि बैसे ॥ध्रु.॥ क्षुधाकाळीं रडे देखिलें तें मागे । कांहीं केल्या नेघे दुजें कांहीं ॥2॥ सहज कौतुकें बोले बापमाये । देवापाशीं आहे मागशी तें ॥3॥ तेव्हां तुजलागीं स्मरे नारायणा । जीवींच्या जीवना पांडुरंगा॥4॥ लागली हे क्षुधा जात असे प्राण । काय हें निर्वाण पाहातोसि ॥5॥ ब्रह्मांडनायक विश्वाचा पाळक । वरी तिन्ही लोक पोसितोसि ॥6॥ प्राण हा उत्कर्ष जाहला विव्हळ । तेव्हां तो कृपाळ धांव घाली ॥7॥ सांडूनि वैकुंठ धांव घाली तइप । आळंगिला बाहीं कृपावंतें ॥8॥ तुका ह्मणे दिला क्षीराचा सागर । राहे निरंतर तयापासीं ॥9॥ 4470 अनाथाचा सखा ऐकिला प्रताप । होसि कृपावंत मजवरि ॥1॥ माझिया गा चित्ता करिं शिकवण । जेणें तुझे चरण जोडतील ॥ध्रु.॥ जोडोनियां कर येतों काकुलती । रकुमाइऩच्या पति कृपावंता ॥2॥ हरुषें निर्भर करीं माझें मन । दाखवीं चरण पांडुरंगा॥3॥ तुझे भेटीविण जन्म गेलां वांयां । भजन कराया शिH नाहीं ॥4॥ न घडे तुझी सेवा न घडे पूजन । जन्मोनि निष्कारण जाऊं पाहे ॥5॥ तुका ह्मणे हरि करावें या काय । भजनासि साहए होइप बापा ॥6॥ 4471 हीनवर बीजवर दोघी त्या गडणी । अखंड कहाणी संसाराची ॥1॥ माझे पति बहु लहान चि आहे । खेळावया जाय पोरांसवें ॥ध्रु.॥ माझें दुःख जरी ऐकशील सइऩ । ह्मातारा तो बाइऩ खोकतसे ॥2॥ खेळे सांजवरी बाहेरी तो राहे । वाट मी पाहें सेजेवरी ॥3॥ पूर्व पुण्य माझें नाहीं वा नीट । बहु होती कष्ट सांगो कांही ॥4॥ जवळ मी जातें अंगा अंग लावूं । नेदी जवळ येऊं कांटाळतो ॥5॥ पूर्व सुकृताचा हा चि बाइऩ ठेवा । तुका ह्मणे देवा काय बोल ॥6॥ 4472 स्वामीच्या सामथ्यॉ । चाले बोलिला पुरुषार्थ ॥1॥ पाठी देवाचें हें बळ । मग लाभे हातीं काळ ॥ध्रु.॥ देव ज्यासी साहए । तेणें केलें सर्व होय ॥2॥ तुका ह्मणे स्वामीसत्ता । मग नाहीं भय चित्ता ॥3॥ 4473 नामांचा डांगोरा फिरवीं घरोघरीं । ह्मणा हरीहरी सर्वभावें ॥1॥ नामें हरती कर्में वैकुंठींची पै विस्त । संनिध श्रीपति सदोदित ॥ध्रु.॥ नामाचा महिमा बहुतां कळला । नामें उद्धरिला अजामेळ ॥2॥ गजेंद्राची िस्थति पुराणीं बोलती । नामें चि श्रीपति पावलासे ॥3॥ तुका ह्मणे घेतां मुिH आहे । नामें सर्व पाहें आकिळलें॥4॥ 4474 यमाचे हे पाश नाटोपती कोणातें । आह्मां दिनानाथें रिक्षयेलें ॥1॥ यम नेतां तुह्मां रक्षील हें कोण । तुह्मां धन्यधन्य कोण ह्मणती ॥ध्रु.॥ संतसज्जनमेळा पवित्र संतकीतिऩ । त्यांनीं उत्तम िस्थति सांगितली ॥2॥ तें चि धरोनि चित्तीं तुका हित करी। यमासि पांपरी हाणे आतां ॥3॥ 4475 देवासी पैं भांडों एकचित्त करूनि । आह्मांसि सज्जनीं सांगितलें ॥1॥ आह्मां काय आतां देवें आडो परी । भेटी नेदी तरी सुखें नेदो ॥ध्रु.॥ तो चि नांदो सदा हरि पैं वैकुंठीं । आह्मां देशवटी देवो सुखें ॥2॥ देवें अभिमान चित्तांत धरिला । तरी तो एकला राहो आतां ॥3॥ चित्तीं धरोनि नाम असों सुखें येथें । हषॉ गाऊं गीत गोविंदाचें ॥4॥ तुका ह्मणे सर्व देवाची नष्टाइऩ । आह्मी सुखें डुलतसों ॥5॥ 4476 भरणी आली मुH पेठा । करा लाटा व्यापार ॥1॥ उधार घ्या रे उधार घ्या रे । अवघे या रे जातीचे ॥ध्रु.॥ येथें पंिHभेद नाहीं । मोठें कांहीं लहान ॥2॥ तुका ह्मणे लाभ घ्यावा। मुद्दल भावा जतन ॥3॥ 4477 ग्रासोग्रासीं भाव । तरी देहिं च जेवी देव ॥1॥ धरीं स्मरण तें सार । नाहीं दुरी तें अंतर ॥ध्रु.॥ भोगितां तूं भावें । देव जेऊं बैसे सवें ॥2॥ तुज पावो देवा । भावें अंतरींची सेवा ॥3॥ गुंतला साधनीं । देव नाहीं त्रिभुवनीं ॥4॥ तुका ह्मणे हातीं । न धरितां गमाविती ॥5॥ 4478 कामिनीसी जैसा आवडे भ्रतार । इच्छीत चकोर चंद्र जैसा ॥1॥ तैसी हे आवडी विठ्ठलाचे पायीं । लागलिया नाहीं गर्भवास ॥ध्रु.॥ दुष्काळें पीडिल्या आवडे भोजन । आणिक जीवन तृषाक्रांता ॥2॥ कामातुर जैसा भय लज्जा सांडोनि । आवडे कामिनी सर्वभावें ॥3॥ तुका ह्मणे तैसी राहिली आवडी । पांडुरंग थडी पाववील ॥4॥ 4479 ॐ तत्सदिति सूत्राचें सार । कृपेचा सागर पांडुरंग॥1॥ हरिःॐ सहित उदत अनुदत । प्रचुरीश्वरासहित पांडुरंग ॥2॥ गोब्राह्मणहिता होऊनि निराळे । वेदाचें तें मूळ तुका ह्मणे ॥3॥ 4480 सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभािळली भूमि शुद्ध ॥1॥ उष्ण तान भूक एवढिये आकांतीं । ओसंगा लाविती काय ह्मुण ॥ध्रु.॥ खांद्यावरि शूळ मरणाचिये वाटे । अन्याय ही मोठे केले साच ॥2॥ हातींचा हिरोनि घातला पोटासी। तुका ह्मणे ऐसी परी जाली ॥3॥ ओंव्या प्रारंभ 231 अभंग 3 4481 पांडुरंगा करूं प्रथम नमन । दुसरें चरणा संतांचिया॥1॥ याच्या कृपादानें कथेचा विस्तार । बाबाजीसद्ग‍ुदास तुका ॥2॥ काय माझी वाणी मानेल संतांसी । रंजवूं चित्तासी आपुलिया ॥3॥ या मनासी लागो हरिनामाचा छंद । आवडी गोविंद गावयासी ॥4॥ सीण जाला मज संवसारसंभ्रमें । सीतळ या नामें जाली काया॥5॥ या सुखा उपमा नाहीं द्यावयासी । आलें आकारासी निविऩकार ॥6॥ नित्य धांवे तेथें नामाचा गजर । घोष जयजयकार आइकतां ॥7॥ तांतडी ते काय हरिगुण गाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥8॥ मूळ नरकाचें राज्यमदेंमाते । अंतरे बहुत देव दुरी ॥9॥ दुरी अंतरला नामनिंदकासी । जैसें गोंचिडासी क्षीर राहे ॥10॥ हे वाट गोमटी वैकुंठासी जातां । रामकृष्णकथा दिंडी ध्वजा ॥11॥ जाणतयांनीं सांगितलें करा । अंतरासी वारा आडूनियां ॥12॥ यांसी आहे ठावें परि अंध होती । विषयाची खंती वाटे जना ॥13॥ नाहीं त्या सुटलीं द्रव्य लोभ माया । भस्म दंड छाया तरुवराची ॥14॥ चित्त ज्याचें पुत्रपत्नीबंधूवरी । सुटल हा परि कैसें जाणा ॥15॥ जाणत नेणत करा हरिकथा । तराल सर्वथा भाक माझी ॥16॥ माझी मज असे घडली प्रचित । नसेल पतित ऐसा कोणी ॥17॥ कोणीं तरी कांहीं केलें आचरण । मज या कीर्तनेंविण नाहीं ॥18॥ नाहीं भय भHा तराया पोटाचें । देवासी तयाचें करणें लागे ॥19॥ लागे पाठोवाटी पाहे पायांकडे । पीतांबर खडे वाट सांडी ॥20॥ डिंकोनियां कां रे राहिले हे लोक । हें चि कवतुक वाटे मज ॥21॥ जयानें तारिले पाषाण सागरीं । तो ध्या रे अंतरीं स्वामी माझा॥22॥ माझिया जीवाची केली सोडवण । ऐसा नारायण कृपाळु हा ॥23॥ हा चि माझा नेम हा चि माझा धर्म । नित्य वाचे नाम विठोबाचें ॥24॥ चेतवला अिग्न तापत्रयज्वाळ । तो करी शितळ रामनाम ॥25॥ मना धीर करीं दृढ चित्तां धरीं । तारील श्रीहरि मायबाप ॥26॥ बाप हा कृपाळु भHा भाविकांसी । घरीं होय दासी कामारी त्या ॥27॥ त्याचा भार माथां चालवी आपुला। जिहीं त्या दिधला सर्व भाव ॥28॥ भावेंविण त्याची प्रािप्त । पुराणें बोलती ऐसी मात ॥29॥ मात त्याची जया आवडे जीवासी। तया गर्भवासीं नाहीं येणें ॥30॥ यावें गर्भवासीं तरी च विष्णुदासीं। उद्धार लोकांसी पूज्य होती ॥31॥ होती आवडत जीवाचे ताइत। त्यां घडी अच्युत न विसंभे ॥32॥ भेदाभेद नाहीं चिंता दुःख कांहीं । वैकुंठ त्या ठायीं सदा वसे ॥33॥ वसे तेथें देव सदा सर्वकाळ । करिती निर्मळ नामघोष ॥34॥ संपदा तयांची न सरे कल्पांतीं । मेळविला भHी देवलाभ ॥35॥ लाभ तयां जाला संसारा येऊनी । भगवंत ॠणी भHी केला ॥36॥ लागलेंसे पिसें काय मूढजनां । काय नारायणा विसरलीं ॥37॥ विसरलीं तयां थोर जाली हाणी । पचविल्या खाणी चौ†यासी ॥38॥ शिकविलें तरी नाहीं कोणा लाज । लागलीसे भाज धन गोड ॥39॥ गोड एक आहे अविट गोविंद । आणीक तो छंद नासिवंत ॥40॥ तळमळ त्याची कांहीं तरी करा । कां रे निदसुरा बुडावया ॥41॥ या जनासी भय यमाचें नाहीं । सांडियेलीं तिहीं एकराज्यें ॥42॥ जेणें अिग्नमाजी घातलासे पाव । नेणता तो राव जनक होता॥43॥ तान भूक जिहीं साहिले आघात । तया पाय हात काय नाहीं॥44॥ नाहीं ऐसा तिहीं केला संवसार । दुःखाचे डोंगर तोडावया ॥45॥ याच जन्में घडे देवाचें भजन । आणीक हें Yाान नाहीं कोठें ॥46॥ कोठें पुढें नाहीं घ्यावया विसांवा । फिरोनि या गांवा आल्याविण॥47॥ विनवितां दिवस बहुत लागती । ह्मणउनि चित्तीं देव धरा ॥48॥ धरा पाय तुह्मी संतांचे जीवासी । वियोग तयांसी देवा नाहीं ॥49॥ नाहीं चाड देवा आणीक सुखाची । आवडी नामाची त्याच्या तया॥50॥ त्याची च उिच्छष्ट बोलतों उत्तरें । सांगितलें खरें व्यासादिकीं ॥51॥ व्यासें सांगितलें भिH हे विचार । भवसिंधु पार तरावया ॥52॥ तरावया जना केलें भागवत । गोवळ गोपी भH माता पिता ॥53॥ तारुनियां खरे नेली एक्यासरें । निमित्तें उत्तरें रुसिया ॥54॥ यासी वर्म ठावें भHां तरावया । जननी बाळ माया राख तान्हें ॥55॥ तान्हेलें भुकेलें ह्मणे वेळोवेळां । न मगतां लळा जाणोनियां ॥56॥ जाणोनियां वर्म देठ लावियेला । द्रौपदीच्या बोलासवें धांवे ॥57॥ धांवे सर्वता धेनु जैसी वत्सा । भHालागीं तैसा नारायण ॥58॥ नारायण व्होवा हांव ज्याच्या जीवा । धन्य त्याच्या दैवा पार नाहीं ॥59॥ पार नाहीं सुखा तें दिलें तयासी । अखंड वाचेसी रामनाम ॥60॥ रामनाम दोनी उत्तम अक्षरें । भवानीशंकरें उपदेशिलीं ॥61॥ उपदेश करी विश्वनाथ कानीं । वाराणसी प्राणी मध्यें मरे ॥62॥ मरणाचे अंतीं राम ह्मणे जरी । न लगे यमपुरी जावें तया ॥63॥ तयासी उत्तम ठाव वैकुंठीं । वसे नाम चित्तीं सर्वकाळ ॥64॥ सर्वकाळ वसे वैष्णवांच्या घरीं । नसे क्षणभरी थिर कोठें ॥65॥ कोठें नका पाहों करा हरिकथा । तेथें अवचिता सांपडेल ॥66॥ सांपडे हा देव भाविकांचे हातीं । शाहाणे मरती तरी नाहीं ॥67॥ नाहीं भलें भHी केलियावांचूनि। अहंता पापिणी नागवण ॥68॥ नागवलों ह्मणे देव मी आपणा । लाभ दिला जना ठकलों तो ॥69॥ तो चि देव येर नव्हे ऐसें कांहीं। जनादऩन ठायीं चहूं खाणी ॥70॥ खाणी भरूनियां राहिलासे आंत । बोलावया मात ठाव नाहीं ॥71॥ ठाव नाहीं रिता कोणी देवाविण । ऐसी ते सज्जन संतवाणी ॥72॥ वाणी बोलूनियां गेलीं एक पुढें । तयासी वांकुडें जातां ठक ॥73॥ ठका नाहीं अर्थ ठाउका वेदांचा । होऊनि भेदाचा दास ठेला ॥74॥ दास ठेला पोट अर्थ दंभासाटीं । ह्मणउनि तुटी देवासवें ॥75॥ सवें देव द्विजातीही दुराविला । आणिकांचा आला कोण पाड ॥76॥ पाड करूनियां नागविलीं फार । पंडित वेव्हार खळवादी ॥77॥ वादका निंदका देवाचें दरुशन । नव्हे जाला पूर्ण षडकमाअ ॥78॥ षडकमाअ हीन रामनाम कंठीं । तयासवें भेटी सवें देवा ॥79॥ देवासी आवड भाविक जो भोळा । शुद्ध त्या चांडाळा करुनि मानी ॥80॥ मानियेल्या नाहीं विश्वास या बोला । नाम घेतां मला युिH थोडी॥81॥ युH थोडी मज दुर्बळाची वाचा । प्रताप नामाचा बोलावया ॥82॥ बोलतां पांगल्या श्रुति नेति नेति । खुंटलिया युिH पुढें त्यांच्या॥83॥ पुढें पार त्याचा न कळे चि जातां । पाउलें देखतां ब्रह्मादिकां॥84॥ काय भHीपिसें लागलें देवासी । इच्छा ज्याची जैसी तैसा होय॥85॥ होय हा सगुण निर्गुण आवडी । भिHिप्रय गोडी फेडावया ॥86॥ या बापासी बाळ बोले लाडें कोडें । करुनि वांकुडें मुख तैसें॥87॥ तैसें याचकाचें समाधान दाता । होय हा राखता सkवकाळीं ॥88॥ सkवकाळीं कामा न येती आयुधें । बळ हा संबंध सैन्यलोक॥89॥ सैन्यलोक तया दाखवी प्रताप । लोटला हा कोप कोपावरी ॥90॥ कोपा मरण नाहीं शांत होय त्यासी । प्रमाण भल्यासी सkवगुणीं॥91॥ सkवरजतमा आपण नासती । करितां हे भिH विठोबाची ॥92॥ चित्त रंगलिया चैतन्य चि होय । तेथें उणें काय निजसुखा ॥93॥ सुखाचा सागरु आहे विटेवरी । कृपादान करी तो चि एक ॥94॥ एक चित्त धरूं विठोबाचे पायीं । तेथें उणें कांहीं एक आह्मां ॥95॥ आह्मांसी विश्वास याचिया नामाचा । ह्मणउनि वाचा घोष करूं॥96॥ करूं हरिकथा सुखाची समाधि । आणिकाची बुद्धी दुष्ट नास ॥97॥ नासे संवसार लोकमोहो माया । शरण जा रे तया विठोबासी॥98॥ सिकविलें मज मूढा संतजनीं । दृढ या वचनीं राहिलोंसे ॥99॥ राहिलोंसे दृढ विठोबाचे पायीं । तुका ह्मणे कांहीं न लगे आंता॥100॥ 4482 गाइऩन ओंविया पंढरिचा देव । आमुचा तो जीव पांडुरंग ॥1॥ रंगलें हें चित्त माझें तया पायीं । ह्मणउनि घेइप हा चि लाहो ॥2॥ लाहो करीन मी हा चि संवसारीं । राम कृष्ण हरि नारायण ॥3॥ नारायण नाम घालितां तुकासी । न येती या रासी तपतीथॉ ॥4॥ तीथॉ रज माथां वंदिती संतांचे । जे गाती हरिचे गुणवाद ॥5॥ गुणवाद ज्याचे गातां पूज्य जाले । बडिवार बोले कोण त्यांचा ॥6॥ त्याचा नाहीं पार कळला वेदांसी । आणीक ही ॠषि विचारितां ॥7॥ विचारितां तैसा होय त्यांच्या भावें । निजसुख ठावें नाहीं कोणा ॥8॥ कोणा कवतुक न कळे हे माव । निजलिया जिवें करी धंदा ॥9॥ करुनि कवतुक खेळे हा चि लीळा । व्यापूनि वेगळा पाहातुसे ॥10॥ सेवटीं आपण एकला चि खरा । सोंग हा पसारा नट केला ॥11॥ लावियेलें चाळा मीपणें हें जन । भोग- तया कोण भोगविशी ॥12॥ विषयीं गुंतलीं विसरलीं तुज । कन्या पुत्र भाज धनलोभा ॥13॥ लोभें गिळी फांसा आविसाच्या आशा। पडोनि मासा तळमळी ॥14॥ तळमळ याची तरी शम होइऩल । जरी हा विठ्ठल आठविती ॥15॥ आठव हा तरी संतांच्या सांगातें। किंवा हें संचित जन्मांतरें ॥16॥ जन्मांतरें तीन भोगितां कळती । केलें तें पावती करितां पुढें ॥17॥ पुढें जाणोनियां करावें संचित। पुजावे अतीत देव द्विज ॥18॥ जन्म तुटे ऐसें नव्हे तुह्मां जना । पुढिल्या पावना धर्म करा ॥19॥ करा जप तप अनुष्ठान याग । संतीं हा मारग स्थापियेला ॥20॥ लावियेलीं कर्में शुद्ध आचरणें । कोणा एका तेणें काळें पावे ॥21॥ पावला सत्वर निष्काम उदार। जिंकिली अपार वासना हे ॥22॥ वासनेचें मूळ छेदिल्या वांचून । तरलेंसें कोणी न ह्मणावें ॥23॥ न ह्मणावें जाला पंडित वाचक । करूं मंत्रघोष अक्षरांचा ॥24॥ चाळविलीं एकें ते चि आवडीनें । लोक दंभमानें देहसुखें ॥25॥ सुख तरी च घडे भजनाचें सार । वाचे निरंतर रामनाम ॥26॥ राम हा उच्चार तरी च बैसे वाचे । अनंता जन्माचें पुण्य होय ॥27॥ पुण्य ऐसें काय रामनामापुढें । काय ते बापुडे यागयYा ॥28॥ यागयYा तप संसार दायकें । न तुटती एके नामेंविण ॥29॥ नामेंविण भवसिंधु पावे पार । अइसा विचार नाहीं दुजा ॥30॥ जाणती हे भHराज महामुनि । नाम सुखधणी अमृताची ॥31॥ अमृताचें सार निजतkव बीज । गुहएाचें तें गुज रामनाम ॥32॥ नामें असंख्यात तारिले अपार । पुराणीं हें सार प्रसिद्ध हे ॥33॥ हें चि सुख आह्मी घेऊं सर्वकाळ । करूनि निर्मळ हरिकथा ॥34॥ कथाकाळीं लागे सकळा समाधि । तात्काळ हे बुिद्ध दुष्ट नासे ॥35॥ नासे लोभ मोहो आशा तृष्णा माया । गातां गुण तया विठोबाचे ॥36॥ विठोबाचे गुण मज आवडती । आणीक हे चित्तीं न लगे कांहीं ॥37॥ कांहीं कोणी नका सांगों हे उपाव। माझा मनीं भाव नाहीं दुजा ॥38॥ जाणोनियां आह्मी दिला जीवभाव। दृढ याचे पाये धरियेले ॥39॥ धरियेले आतां न सोडीं जीवेंसी । केला ये च विशीं निरधार ॥40॥ निरधार आतां राहिलों ये नेटीं। संवसारतुटी करूनियां ॥41॥ येणें अंगीकार केला पांडुरंगें । रंगविला रंगें आपुलिया ॥42॥ आपुली पाखर घालुनियां वरि । आह्मांसी तो करी यत्न देव ॥43॥ देव राखे तया आणिकांचें काय। करितां उपाय चाले तेथें ॥44॥ तेथें नाहीं रिघ किळकाळासी जातां । दास ह्मणवितां विठोबाचे ॥45॥ विठोबाचे आह्मी लाडिके डिंगर । कांपती असुर काळ धाकें ॥46॥ धाक तिहीं लोकीं जयाचा दरारा । स्मरण हें करा त्याचें तुह्मी ॥47॥ तुह्मी निदसुर नका राहूं कोणी । चुकावया खाणी गर्भवास ॥48॥ गर्भवासदुःख यमाचें दंडणें । थोर होय शीण येतां जातां ॥49॥ तान भूक पीडा जीतां ते आगात । मेल्या यमदूत जाच करिती ॥50॥ जाच करिती हे ह्मणसी कोणा आहे ठावें । नरकीं कौरवें बुडी दिली ॥51॥ बुडी दिली कुंभपाकीं दुयाौधनें । दाविना लाजेनें मुख धर्मा ॥52॥ धर्म हा कृपाळू आलासे जवळी । बैसला पाताळीं वरि नये ॥53॥ न ये वरि कांहीं करितां उपाव । भोगवितो देव त्याचे त्यासी ॥54॥ त्यांसी अभिमान गर्व या देहाचा । नुच्चारिती वाचा नारायण ॥55॥ नारायण विसरलीं संवसारीं । तया अघोरीं वास सत्य ॥56॥ सत्य मानूनियां संतांच्या वचना । जा रे नारायणा शरण तुह्मी ॥57॥ तुह्मी नका मानूं कोणी विसवास। पुत्र पत्नी आस धन वित्त॥58॥ धन वित्त लोभ माया मोहपाश । मांडियले फासे यमदूतीं ॥59॥ दूतीं याच्या मुखा केलेंसे कुडण । वाचे नारायण येऊं नेदी ॥60॥ नेदी शुद्धबुिद्ध आतळों चित्तासी । नाना कर्म त्यासी दुरावती॥61॥ दुराविलीं एकें जाणतीं च फार । निंदा अहंकार वादभेद ॥62॥ वाद भेद निंदा हे फंद काळाचें । गोवितील वाचे रिकामिकें ॥63॥ रिकामिक देवा होय नव्हे मना । चिंतेचिये घाणा जुंपिजेसी ॥64॥ सेवटीं हे गळा लावुनियां दोरी । सांभाळ ये करी वासनेचा ॥65॥ वासनेचा संग होय अंतकाळीं । तरी तपोबळी जन्म धरी ॥66॥ धरूनियां देव राहतील चित्तीं । आधींचिया गती आठवाया ॥67॥ आठवावा देव मरणाचे काळीं। ह्मणउनि बळी जीव दिले ॥68॥ दिले टाकूनियां भोग ॠषेश्वरीं । खाती वनांतरीं कंदमूळें ॥69॥ मुळें सुखाचिया देव अंतरला । अल्पासाटीं नेला अधोगती ॥70॥ गति हे उत्तम व्हावया उपाव । आहे धरा पाव विठोबाचे ॥71॥ विठोबाचे पायीं राहिलिया भावें । न लगे कोठें जावें वनांतरा॥72॥ तरती दुबळीं विठोबाच्या नांवें। संचित ज्या सवें नाहीं शुद्ध॥73॥ शुद्ध तरी याचे काय तें नवल। ह्मणतां विठ्ठल वेळोवेळां ॥74॥ वेळा कांहीं नाहीं कवणाचे हातीं । न कळे हे गति भविष्याची॥75॥ भविष्य न सुटे भोगिल्यावांचूनि । संचित जाणोनि शुद्ध करा ॥76॥ करावे सायास आपुल्या हिताचे । येथें आलियाचे मनुष्यपण ॥77॥ मनुष्यपण तरी साधी नारायण । नाहीं तरी हीन पशुहूनी ॥78॥ पशु पाप पुण्य काय ते जाणती । मनुष्या या गति ठाउकिया॥79॥ ठाउकें हें असे पाप पुण्य लोका । देखती ते एकां भोगितिया॥80॥ भोगतील एक दुःख संवसारीं । काय सांगों परी वेगळाल्या ॥81॥ ल्यावें खावें बरें असावें सदैव । हे चि करी हांव संवसारीं ॥82॥ संवसारें जन गििळले सकळ । भोगवितो फळ गर्भवासा ॥83॥ वासनेचें मूळ छेदिल्यावांचून । नव्हे या खंडण गर्भवासा ॥84॥ सायास केलियावांचुनि तें कांहीं । भोगावरी पाहीं घालूं नये ॥85॥ नये बळें धड घालूं कांटएावरि । जाये जीवें धरी सर्प हातीं ॥86॥ हातीं आहे हित करील तयासी । ह्मणउनि ॠषीं सांगितलें ॥87॥ सांगती या लोकां फजित करूनि ।आपण जे कोणी तरले ते॥88॥ तेणें वाळवंटीं उभारिले कर । कृपेचा सागर पांडुरंग ॥89॥ गंगाचरणीं करी पातकांची धुनी । पाउलें तीं मनीं चिंतिलिया ॥90॥ चिंतनें जयाच्या तारिले पाषाण । उद्धरी चरण लावूनियां ॥91॥ लावूनियां टाळी नलगे बैसावें । प्रेमसुख घ्यावें संतसंगें ॥92॥ संतसंगें कथा करावें कीर्तन । सुखाचें साधन रामराम ॥93॥ मग कोठें देव जाऊं न सके दुरी । बैसोनि भीतरी राहे कंठीं ॥94॥ राहे व्यापुनियां सकळ शरीर । आपुला विसर पडों नेदी ॥95॥ नेदी दुःख देखों आपुलिया दासा । वारी गर्भवासा यमदूता ॥96॥ तान भूक त्यासी वाहों नेदी चिंता । दुिंश्चत हे घेतां नाम होती ॥97॥ होती जीव त्यांचे सकळ ही जंत । परि ते अंकित संचिताचे ॥98॥ चेवले जे कोणी देहअभिमानें । त्यांसी नारायणें कृपा केली ॥99॥ कृपाळू हा देव अनाथा कोंवसा । आह्मी त्याच्या आशा लागलोंसों ॥100॥ लावियेले कासे येणें पांडुरंगें । तुका ह्मणे संगें संतांचिया ॥101॥ 4483 विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥1॥ एकांत एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥2॥ तर्कवितकिर्णी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥3॥ कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आह्मांपाशीं ॥4॥ बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥5॥ भेऊनियां जना एकी सवा जाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥6॥ कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥7॥ तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । ह्मणउनि समेळ मेळविला ॥8॥ अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥9॥ हरिरूपीं दृिष्ट कानीं त्या च गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥10॥ न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ॥11॥ विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥12॥ अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी जाल्या कृष्णरूपा॥13॥ कृष्णा ह्मणोनियां देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥14॥ ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥15॥ न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उसिर केला ॥16॥ रित्या Yाानगोष्टी तयां नावडती । आिंळगण प्रीती कृष्णाचिया ॥17॥ मागें कांहीं आह्मी चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥18॥ आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥19॥ अनुतापें जाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥20॥ जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥21॥ होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥22॥ निवालेया देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला॥23॥ साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा॥24॥ हरिअंगसंगें हरिरूप जाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥25॥ व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वताौनि असतां घराचारी ॥26॥ सकळा चोरोनि हरि जयां चित्तीं । धन्य त्या नांदती तयामध्यें॥27॥ उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥28॥ न कळे लाघव ब्रह्मादिकां भाव । भिHभावें देव केला तैसा ॥29॥ तुका ह्मणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥30॥ बाळक्रीडा प्रारंभ अभंग - 100 4484 देवा आदिदेवा जगत्रया जीवा । परियेसीं केशवा विनंती माझी ॥1॥ माझी वाणी तुझे वर्णी तुझे वर्णी गुण नाम । ऐसी देइप प्रेम कांहीं कळा ॥2॥ कळा तुजपाशीं आमचें जीवन । उचित करून देइप आह्मां ॥3॥ आह्मां शरणागतां तुझा चि आधार। तूं तंव सागर कृपासिंधु ॥4॥ सिंधु पायावाट होय तुझ्या नामें । जाळीं महाकर्में दुस्तरें तीं ॥5॥ तीं फळें उत्तमें तुझा निजध्यास । नाहीं गर्भवास सेविलिया ॥6॥ सेविंलिया राम कृष्ण नारायण । नाहीं त्या बंधन संसाराचें ॥7॥ संसार तें काय तृणवतमय । अिग्न त्यासी खाय क्षणमात्रें ॥8॥ क्षणमात्रें जाळी दोषांचिया रासी । निंद्य उत्तमासी वंद्य करी ॥9॥ करीं िब्रदें साच आपलीं आपण । पतितपावन दिनानाथ ॥10॥ नाथ अनाथाचा पति गोपिकांचा । पुरवी चित्तींचा मनोरथ ॥11॥ चित्तीं जें धरावें तुका ह्मणे दासीं । पुरविता होसी मनोरथ ॥12॥ 4485 मनोरथ जैसे गोकुळींच्या जना । पुरवावी वासना तयापरी ॥1॥ रिण फेडावया अवतार केला । अविनाश आला आकारासी ॥2॥ सीण जाला वसुदेवदेवकीस । वधी बाळें कंस दुराचारी ॥3॥ दुराचारियासी नाहीं भूतदया । आप पर तया पाप पुण्य ॥4॥ पुण्यकाळ त्याचा राहिलासे उभा । देवकीच्या गर्भा देव आले ॥5॥ गर्भासी तयांच्य आला नारायण । तुटलें बंधन आपेंआप॥6॥ आपेंआप बेडएा तुटल्या शंकळा । बंदाच्या आगळा किलिया कोंडे ॥7॥ कोंडमार केला होता बहु दिस । सोडवी निमिष्य नलगतां ॥8॥ न कळे तो त्यासी सांगितला भाव । आपणासी ठाव नंदाघरीं ॥9॥ नंदाघरीं जातां येतां वसुदेवा । नाहीं जाला गोवा सवें देव ॥10॥ सवें देव तया आड नये कांहीं । तुका ह्मणे नाहीं भय चिंता ॥11॥ 4486 चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी । प्रवेश भीतरी केला देवें ॥1॥ देव आला घरा नंदाचिया गांवा । धन्य त्याच्या दैवा दैव आलें ॥2॥ आलें अविनाश धरूनि आकार । दैत्याचा संहार करावया ॥3॥ करावया भHजनाचें पालण । आले रामकृष्ण गोकुळासी ॥4॥ गोकुळीं आनंद प्रगटलें सुख । निर्भर हे लोक घरोघरीं ॥5॥ घरोघरीं जाला लIमीचा वास । दैन्यदािळद्रास त्रास आला ॥6॥ आला नारायण तयांच्या अंतरा । दया क्षमा नरा नारीलोकां ॥7॥ लोकां गोकुळींच्या जालें ब्रह्मYाान । केलियावांचून जपतपें ॥8॥ जपतपें काय करावीं साधनें । जंवें नारायणें कृपा केली ॥9॥ केलीं नारायणें आपुलीं अंकित । तो चि त्यांचें हित सर्व जाणे ॥10॥ सर्व जाणे एक विष्णु साच खरा । आणीक दुसरा नाहींनाहीं ॥11॥ नाहीं भHा दुजें तिहीं त्रिभुवनीं । एका चक्रपाणीवांचूनियां ॥12॥ याच्या सुखसंगें घेती गर्भवास । तुका ह्मणे आस त्यजूनियां ॥13॥ 4487 यांच्या पूर्वपुण्या कोण लेखा करी । जिंहीं तो मुरारी खेळविला ॥1॥ खेळविला जिंहीं अंतर्बाहएसुखें । मेळवूनि मुखें चुंबन दिलें ॥2॥ दिलें त्यांसी सुख अंतरीचें देवें । जिंहीं एका भावें जाणितला ॥3॥ जाणितला तिहीं कामातुर नारी । कृष्णभोगावरी चित्त ज्यांचें ॥4॥ ज्यांचें कृष्णीं तन मन जालें रत । गृह पति सुत विसरल्या ॥5॥ विष तयां जालें धन मान जन । वसविती वन एकांतीं त्या ॥6॥ एकांतीं त्या जाती हरीसी घेउनि । भोगइच्छाधणी फेडावया ॥7॥ वयाच्या संपन्ना तैसा त्यांकारणें । अंतरींचा देणें इच्छाभोग ॥8॥ भोग त्याग नाहीं दोन्ही जयापासीं । तुका ह्मणे जैसी स्पटिकशिळा ॥9॥ 4488 शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाउनियां छंदे जैसी तैसी ॥1॥ जैसा केला तैसा होय क्षणक्षणा । फेडावी वासना भिHभावें ॥2॥ फेडावया आला अवघियांची धणी । गोपाळ गौळणी मायबापा ॥3॥ मायबापा सोडविलें बंदीहुनि । चाणूर मदुऩनी कंसादिक ॥4॥ दिक नाहीं देणें अरिमित्रा एक । पूतना कंटक मुH केली ॥5॥ मुH केला मामा कंस महादोषी । बाळहत्या रासी पातकांच्या ॥6॥ पाप कोठें राहे हरी आठवितां । भHी द्वेषें चिंता जैसा तैसा ॥7॥ साक्षी तयापाशीं पूर्वीलकर्माच्या। बांधला सेवेच्या रुणी देव ॥8॥ देव भोळा धांवे भHा पाठोवाठी। उच्चारितां कंठीं मागेंमागें ॥9॥ मानाचा कंटाळा तुका ह्मणे त्यासी। धांवे तो घरासी भाविकांच्या ॥10॥ 4489 चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । बांधवी तो हातीं गौळणीच्या ॥1॥ गौळणिया गळा बांधिती धारणीं । पायां चक्रपाणी लागे तया ॥2॥ तयाघरीं रिघे चोरावया लोणी । रितें पाळतूनि शिरे माजी ॥3॥ माजी शिरोनियां नवनीत खाये । कवाड तें आहे जैसें तैसें ॥4॥ जैसा तैसा आहे अंतर्बाहएात्कारीं । ह्मणउनि चोरी नसंपडे ॥5॥ नसंपडे तयां करितां खटपट । वाउगे बोभाट वर्माविण ॥6॥ वर्म जाणती त्या एकल्या एकटा । बैसतील वाटा निरोधूनि ॥7॥ निवांत राहिल्या निःसंग होऊनि । निश्चळ ज्या ध्यानीं कृष्णध्यान ॥8॥ न ये क्षणभरी योगियांचे ध्यानीं । धरिती गौळणी भाविका त्या ॥9॥ भाविका तयांसी येतो काकुलती। शाहाण्या मरती नसंपडे ॥10॥ नलगे वेचावी टोळी धनानांवें । तुका ह्मणें भावें चाड एका ॥11॥ 4490 चाड अनन्याची धरी नारायण । आपणासमान करी रंका ॥1॥ रंक होती राजे यमाचिये घरीं । आचरणें बरी नाहीं ह्मणवोनि ॥2॥ नसंपडे इंद्रचंद्रब्रह्मादिकां । अभिमानें एका तिळमात्रें॥3॥ तिळमात्र जरी होय अभिमान । मेरु तो समान भार देवा ॥4॥ भार पृथिवीचा वाहिला सकळ । जड होती खळ दुष्ट लोक ॥5॥ दुष्ट अभH जे निष्ठ‍ मानसीं । केली हे तयांसी यमपुरी ॥6॥ यमदूत त्यांसी करिती यातना । नाहीं नारायणा भजिजेलें ॥7॥ जे नाहीं भजले एका भावें हरी । तयां दंड करी यमधर्म ॥8॥ यमधर्म ह्मणे तयां दोषियांसी । कां रे केशवासी चुकलेती ॥9॥ चुकलेती कथा पुराणश्रवण । होते तुह्मां कान डोळे मुख ॥10॥ कान डोळे मुख संतांची संगति । न धरा च चित्तीं सांगितलें ॥11॥ सांगितलें संतीं तुह्मां उगवूनि । गर्भाद येऊनि यमदंड ॥12॥ दंडूं आह्मीं रागें ह्मणे यमधर्म । देवा होय श्रम दुर्जनाचा ॥13॥ दुर्जनाचा याणें करूनि संहार । पूर्णअवतार रामकृष्ण ॥14॥ रामकृष्णनामें रंगले जे नर । तुका ह्मणे घर वैकुंठी त्यां ॥15॥ 4491 वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरिजन । तया नारायण समागमें ॥1॥ समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चित्तवित्त समपिऩलें ॥2॥ समथॉ तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे॥3॥ रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाइऩ चारी ॥4॥ गाइऩ चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीचें ॥5॥ काय गौिळयांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या ह्मैसी गाइऩ पशु ॥6॥ सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरि ॥7॥ धणीवरि त्यांसी सांगितली मात । जयाचें जें आर्त तयापरी ॥8॥ परी याचि तुह्मी आइका नवळ । दुर्गम जो खोल साधनासि ॥9॥ शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥10॥ तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥11॥ हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥12॥ तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका ह्मणे वर्म दावी सोपें ॥13॥ 4492 दावी वर्म सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥1॥ मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥2॥ मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरि स्नान तेणें ॥3॥ वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥4॥ तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥5॥ यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥6॥ त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें। उिच्छष्ट तें खावें धणीवरी ॥7॥ वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥8॥ छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥9॥ विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥10॥ पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥11॥ ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका ह्मणे संगें भHांचिया ॥12॥ 4493 भHजनां दिलें निजसुख देवें । गोपिका त्या भावें आळंगिल्या ॥1॥ आळंगिल्या गोपी गुणवंता नारी । त्यांच्या जन्मांतरीं हरि ॠणी ॥2॥ रुसलिया त्यांचें करी समाधान । करविता आण क्रिया करी ॥3॥ क्रिया करी तुह्मां न वजे पासुनि । अवघियाजणी गोपिकांसी ॥4॥ गोपिकांसी ह्मणे वैकुंठींचा पति । तुह्मीं माझ्या चित्तीं सर्वभावें ॥5॥ भाव जैसा माझ्याठायीं तुह्मी धरा । तैसा चि मी खरा तुह्मांलागीं ॥6॥ तुह्मां कळों द्या हा माझा साच भाव । तुमचा चि जीव तुह्मां ग्वाही ॥7॥ ग्वाही तुह्मां आह्मां असे नारायण। आपली च आण वाहातसे ॥8॥ सत्य बोले देव भिHभाव जैसा। अनुभवें रसा आणूनियां ॥9॥ यांसी बुझावितो वेगळाल्या भावें । एकीचें हें ठावें नाहीं एकी ॥10॥ एकी क्रिया नाहीं आवघियांचा भाव । पृथक हा देव घेतो तैसें ॥11॥ तैसें कळों नेदी जो मी कोठें नाहीं । अवघियांचे ठायीं जैसा तैसा ॥12॥ जैसा मनोरथ जये चित्तीं काम । तैसा मेघशाम पुरवितो ॥13॥ पुरविले मनोरथ गोपिकांचे । आणीक लोकांचे गोकुळींच्या ॥14॥ गोकुळींच्या लोकां लावियेला छंद । बैसला गोविंद त्याचा चित्तीं ॥15॥ चित्तें ही चोरूनि घेतलीं सकळा । आवडी गोपाळांवरी तयां ॥16॥ आवडे तयांसी वैकुंठनायक । गेलीं सकिळक विसरोनि ॥17॥ निंदा स्तुती कोणी न करी कोणाची । नाहीं या देहाची शुिद्ध कोणा॥18॥ कोणासी नाठवे कन्या पुत्र माया । देव ह्मणुनि तया चुंबन देती ॥19॥ देती या टाकून भ्रतारांसी घरीं । लाज ते अंतरीं आथी च ना ॥20॥ नाहीं कोणा धाक कोणासी कोणाचा । तुका ह्मणे वाचा काया मनें ॥21॥ 4494 मनें हरिरूपीं गुंतल्या वासना । उदास या सुना गौिळयांच्या ॥1॥ यांच्या भ्रतारांचीं धरूनियां रूपें । त्यांच्या घरीं त्यांपें भोग करी ॥2॥ करी कवतुक त्याचे तयापरी । एकां दिसे हरि एकां लेंक ॥3॥ एक भाव नाहीं सकळांच्या चित्तीं । ह्मणऊनि प्रीति तैसें रूप ॥4॥ रूप याचें आहे अवघें चि एक । परि कवतुक दाखविलें ॥5॥ लेंकरूं न कळे स्थूल कीं लहान । खेळे नारायण कवतुकें ॥6॥ कवतुक केलें सोंग बहुरूप । तुका ह्मणे बाप जगाचा हा ॥7॥ 4495 जगाचा हा बाप दाखविलें माये । माती खातां जाये मारावया ॥1॥ मारावया तिणें उगारिली काठी । भुवनें त्या पोटीं चौदा देखे ॥2॥ देखे भयानक झांकियेले डोळे । मागुता तो खेळे तयेपुढे ॥3॥ पुढें रिघोनियां घाली गळां कव । कळों नेदी माव मायावंता ॥4॥ मायावंत विश्वरूप काय जाणे । माझें माझें ह्मणे बाळ देवा ॥5॥ बाळपणीं रीठा रगडिला दाढे । मारियेले गाढे कागबग ॥6॥ गळां बांधऊनि उखळासी दावें । उन्मळी त्या भावें विमळार्जुन ॥7॥ न कळे जुनाट जगाचा जीवन । घातलें मोहन गौिळयांसी ॥8॥ सिंकीं उतरूनि खाय नवनीत । न कळे बहुत होय तरी ॥9॥ तरीं दुधडेरे भरले रांजण । खाय ते भरून दावी दुणी ॥10॥ दुणी जालें त्याचा मानिती संतोष दुभत्याची आस धरूनियां ॥11॥ आशाबद्धा देव असोनि जवळी । नेणती ते काळीं स्वार्थामुळें ॥12॥ मुळें याच देव न कळे तयांसी । चित्त आशापाशीं गोवियेलें ॥13॥ लेंकरूं आमचें ह्मणे दसवंती । नंदाचिये चित्तीं तो चि भाव ॥14॥ भाव जाणावया चरित्र दाखवी। घुसिळतां रवी डेरियांत ॥15॥ डेरियांत लोणी खादलें रिघोनि । पाहे तों जननी हातीं लागे ॥16॥ हातीं धरूनियां काढिला बाहेरी। देखोनियां करी चोज त्यासी ॥17॥ सिकवी विचार नेणे त्याची गती । होता कोणे रीती डेरियांत ॥18॥ यांसी पुत्रलोभें न कळे हा भाव । कळों नेदी माव देव त्यांसी ॥19॥ त्यांसी मायामोहजाळ घाली फांस । देर आपणास कळों नेदी ॥20॥ नेदी राहों भाव लोभिकांचे चित्तीं । जाणतां चि होती अंधळीं तीं ॥21॥ अंधळीं तीं तुका ह्मणे संवसारीं । जिहीं नाहीं हरि ओळखिला ॥22॥ 4496 ओळखी तयांसी होय एका भावें । दुसरिया देवें न पविजे ॥1॥ न पविजे कदा उन्मत्त जालिया । डंबु तो चि वांयां नागवण ॥2॥ वनवास देवाकारणें एकांत । करावीं हीं व्रततपें याग॥3॥ व्रत याग यांसी फळलीं बहुतें । होतीं या संचितें गौिळयांची ॥4॥ यांसी देवें तारियेलें न कळतां । मागील अनंता ठावें होतें ॥5॥ होतें तें द्यावया आला नारायण । मायबापां रीण गौिळयांचें ॥6॥ गौिळयांचें सुख दुर्लभ आणिकां । नाहीं ब्रह्मादिकां तुका ह्मणे ॥7॥ 4497 नेणतियांसाटीं नेणता लाहान । थिंकोनि भोजन मागे माये ॥1॥ माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥2॥ तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥3॥ घेउनियां एके ठायीं अवतार । एकीं केला थोर वाढवूनि॥4॥ उणा पुरा यासी नाहीं कोणी ठाव । सारिखा चि देव अवघियांसी॥5॥ यासी दोनी ठाव सारिखे अनंता । आधील मागुता वाढला तो ॥6॥ वाढला तो सेवाभिHचिया गुणें । उपचारमिष्टान्नें करूनियां ॥7॥ करोनियां सायास मेळविलें धन । तें ही कृष्णार्पण केलें तीहीं ॥8॥ कृष्णासी सकळ गाइऩ घोडे ह्मैसी । समपिऩल्या दासी जीवें भाव॥9॥ जीवें भावें त्याची करितील सेवा । न विसंबती नांवा क्षणभरी॥10॥ क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥11॥ त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चित्त त्यापें ॥12॥ त्याचें चि चिंतन कृष्ण कोठें गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण॥13॥ कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयरा भेटों कृष्णा ॥14॥ कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥15॥ कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वपनीं कृष्णरूप ॥16॥ कृष्ण त्यांस दिसे आभास दुिश्चतां । धन्य मातापिता तुका ह्मणे ॥17॥ 4498 कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी ह्मणे ॥1॥ ह्मणे कृष्णाविण कैसें तुह्मां गमे । विळ हा करमे वांयांविण ॥2॥ वांयांविण तुह्मीं पिटीत्या चाकटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥3॥ क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥4॥ याचें सुख तुह्मां कळलियावरि । मग दारोदारीं न फिराल ॥5॥ लटिकें हें तुह्मां वाटेल खेळणें । एका कृष्णाविणें आवघें चि ॥6॥ अवघ्यांचा तुह्मीं टाकाल सांगात । घेऊनि अनंत जाल राना ॥7॥ नावडे तुह्मांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरिध्यान ॥8॥ न करा हा मग या जीवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥9॥ आणिका ही तुह्मा येती काकुलती। जवळी इिच्छती क्षण बैसों ॥10॥ बैसों चला पाहों गोपाळाचें मुख। एकी एक सुख सांगतील ॥11॥ सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव धरिती चित्तीं बाळा ॥12॥ बाळा एकी घरा घेउनियां जाती । नाहीं त्या परती तुका ह्मणे ॥13॥ 4499 तुका ह्मणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥1॥ दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥2॥ याच्या मुखें नये डोळयासी वीट । राहिले हे नीट ताटस्थ चि ॥3॥ ताटस्थ राहिलें सकळ शरीर । इंिद्रयें व्यापार विसरलीं ॥4॥ विसरल्या तान भुक घर दार । नाहीं हा विचार आहों कोठें ॥5॥ कोठें असों कोण जाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥6॥ विसरल्या आह्मीं कोणीये जातीच्या। वर्णा ही चहूंच्या एक जाल्या ॥7॥ एक जाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । निःशंकें भातुकें खेळतील ॥8॥ खेळता भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥9॥ चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥10॥ जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करूनियां ॥11॥ करिती आपला आवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥12॥ त्याणीं केला हरि सासुरें माहेर । बंधु हे कुमर दीर भावें ॥13॥ भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका ह्मणे पायीं गोविंदाचे ॥14॥ 4500 गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एक चि तो ॥1॥ एकाचीं च नामें ठेवियेलीं दोनी । किल्पतील मनीं यावें जावें ॥2॥ जावें यावें तिहीं घरऴिचया घरीं । तेथिची सिदोरी तेथें न्यावी ॥3॥ विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥4॥ लोक करूनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥5॥ लटिकीं करिती मंगळदायकें । लटिकीं च एकें एकां व्याही ॥6॥ व्याही भाइऩ हरि सोयरा जावायी । अवघियांच्या ठायीं केला एक ॥7॥ एकासि च पावे जें कांहीं करिती । उपचार संपित्त नाना भोग ॥8॥ भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाइऩ ॥9॥ लटिका च त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥10॥ त्यांणीं मृित्तकेचें करूनि अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥11॥ पुरुषनारी त्यांणीं ठेवियेलीं नावें । कवतुकभावें विचरती ॥12॥ विचरती जैसे साच भावें लोक । तैसें नाहीं सुख खेळतीया ॥13॥ यांणीं जाणितलें आपआपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥14॥ खेळतों ते आह्मीं नव्हों नारीनर । ह्मणोनि विकार नाहीं तयां ॥15॥ तया ठावें आहे आह्मी अवघीं एक । ह्मणोनि निःशंक खेळतील ॥16॥ तयां ठावें नाहीं हरिचिया गुणें । आह्मी कोणकोणें काय खेळों ॥17॥ काय खातों आह्मी कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखी॥18॥ मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वरणा याती काज न धरिती॥19॥ धरितील कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती॥20॥ नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्तीं मनीं बैसलासे ॥21॥ बैसलासे हरि जयांचिये चित्तीं । तयां नावडती मायबापें ॥22॥ मायबापें त्यांचीं नेती पाचारुनि । बळें परि मनीं हरि वसे ॥23॥ वसतील बाळा आपलाले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥24॥ गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती॥25॥ न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक जालें ॥26॥ एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैशा ॥27॥ तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका ह्मणे हरि बाळलीला॥28॥ 4501 लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥1॥ मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥2॥ नभाचा ही साक्षी पाताळापरता । कुर्वािळते माता हातें त्यासि ॥3॥ हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे ह्मणे तीस पोट धालें ॥4॥ पोट धालें मग देतसे ढेंकर । भHीचें तें फार तुळसीदळ ॥5॥ तुळसीदळ भावें सहित देवापाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥6॥ क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भHीचें तें जळ गोड देवा ॥7॥ देवा भH जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्याठायीं ॥8॥ त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका ह्मणे करी सर्व काज ॥9॥ 4502 जयेवेळीं चोरूनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥1॥ लागे दोहीं ठायी करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥2॥ माय जाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा जाला ॥3॥ जाला तैसा जैसे घरिंचे गोपाळ । आणिक सकळ मोहरी पांवे ॥4॥ मोहरी पांवे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रह्मादिकीं ॥5॥ ब्रह्मांदिकां सुख स्वपनीं ही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥6॥ वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आइऩ तैसा जाला ॥7॥ लाघव कळलें ब्रह्मयासी याचें । परब्रह्म साचें अवतरलें ॥8॥ तरले हे जन सकळ ही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥9॥ लागला हे स्तुती करूं अनंताची । चतुर्मुख वाची भHी स्तोत्रें ॥10॥ भिHकाजें देवें केला अवतार। पृथ्वीचा भार फेडावया ॥11॥ पृथिवी दाटीली होती या असुरीं । नासाहावे वरीभार तये ॥12॥ तया काकुलती आपल्या दासांची । तयालागीं वेची सर्वस्व ही ॥13॥ स्वहित दासांचें करावयालागीं । अव्यH हें जगीं व्यHी आलें ॥14॥ लेखा कोण करी यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥15॥ हरी नाममात्रें पातकांच्या रासी । तो आला घरासि गौिळयांच्या ॥16॥ गौिळये अवघीं जालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥17॥ तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होइल पाप ॥18॥ पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तो चि पाहे कृष्णमुख ॥19॥ मुख माझें काय जो मी वणूप पार । मग नमस्कार घाली ब्रह्मा ॥20॥ ब्रह्मा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासि हा चि देव ॥21॥ देव चि अवगा जालासे सकळ । गाइऩ हा गोपाळ वत्सें तेथें ॥22॥ तेथें पाहाणें जें आणीक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥23॥ दुजा भाव तुका ह्मणे जया चित्ती । रवरव भोगिती कुंभपाक ॥24॥ 4503 कुंभपाक लागे तयासि भोगणें । अवघा चि नेणे देव ऐसा ॥1॥ देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासि यातना यमकरी ॥2॥ कळला हा देव तया साच खरा । गाइऩ वत्सें घरा धाडी ब्रह्मा ॥3॥ ब्रह्मादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥4॥ जाणवेल देव गौिळयांच्या भावें । तुका ह्मणे सेवे संचित हें ॥5॥ 4504 संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां परि त्याचें ॥1॥ त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाइऩवरी आणिक गाइऩ ॥2॥ गाइऩ दवडुनि घालिती बाहेरी । तंव ह्मणे हरि बांधा त्या ही ॥3॥ त्याही तुह्मी बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाडएांतुनि ॥4॥ पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥5॥ नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥6॥ मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका ह्मणे ॥7॥ 4505 तुका ह्मणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥1॥ करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥2॥ दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥3॥ नाही ताळ गातां नाचतां गोपाळां । घननीळ सावळा तयामध्यें ॥4॥ मधीं जयां हरि तें सुख आगळें । देहभाव काळें नाहीं तयां ॥5॥ तयांसि आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥6॥ निजभाव देखे जयांचिये अंगीं । तुका ह्मणे संगीं क्रीडे तयां ॥7॥ 4506 तयांसवें करी काला दहींभात । सिदो†या अनंत मेळवुनी ॥1॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥2॥ नेदी चोरी करूं जाणे अंतरींचें । आपलें हीं साचें द्यावें तेथें ॥3॥ द्यावा दहींभात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडवावा ॥4॥ वांटी सकळांसि हातें आपुलिया । जैसें मागे तया तैसें द्यावें ॥5॥ द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपण हि खावें त्यांचें तुक ॥6॥ तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणे गति भला बुरा ॥7॥ राखे त्यासि तैसें आपलाल्या भावें । विचारुनि द्यावें जैसें तैसें ॥8॥ तैसें सुख नाहीं वैकुंठींच्या लोकां । तें दिलें भाविकां गोपाळांसि ॥9॥ गोपाळांचे मुखीं देउनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥10॥ त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस। झोंबतां हातांस खाय बळें ॥11॥ बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तयातें गोपाळ पाडितील ॥12॥ पाठी उचलूनि वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवुनी ॥13॥ मांदीं मेळवुनी धणी दिली आह्मां। तुका ह्मणे जमा केल्या गाइऩ ॥14॥ 4507 केला पुढें हरि अस्तमाना दिसा । मागें त्यासरिसे थाट चाले ॥1॥ थाट चाले गाइऩ गोपाळांची धूम । पुढें कृष्ण राम तयां सोयी ॥2॥ सोयी लागलिया तयांची अनंती । न बोलवितां येती मागें तया ॥3॥ तयांचिये चित्तीं बैसला अनंत । घेती नित्यनित्य तें चि सुख ॥4॥ सुख नाहीं कोणा हरिच्या वियोगें । तुका ह्मणे जुगें घडी जाय ॥5॥ 4508 जाय फाकोनियां निवडितां गाइऩ । आपलाल्या सोयी घराचिये ॥1॥ घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे॥2॥ गोविंदे वेधिलें तुका ह्मणे मन । वियोगें ही ध्यान संयोगाचें ॥3॥ 4509 संयोग सकळां असे सर्वकाळ । दुिश्चत्त गोपाळ आला दिसे ॥1॥ गोपाळ गुणाचा ह्मणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥2॥ उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली॥3॥ दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भिHचिया सुखा गोडावला ॥4॥ लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें जाला देवी ॥5॥ देवी ह्मैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥6॥ हरि तुका ह्मणे अवघा एकला । परि या धाकुला भHासाटीं ॥7॥ 4510 भHीसाटीं केली यशोदेसी आळी । थिंकोनिया चोळी डोळे देव ॥1॥ देव गिळुनियां धरिलें मोहन । माय ह्मणे कोण येथें दुजें ॥2॥ दुजें येथें कोणी नाहीं कृष्णाविण । निरुते जाणोन पुसे देवा ॥3॥ देवापाशीं पुसे देव काय जाला । हांसें आलें बोला याचें हरि ॥4॥ यांचे मी जवळी देव तो नेणती । लटिकें मानिती साच खरें ॥5॥ लटिकें तें साच साच तें लटिके । नेणती लोभिकें आशाबद्ध ॥6॥ सांग ह्मणे माय येरु वासी तोंड । तंव तें ब्रह्मांड देखे माजी ॥7॥ माजी जया चंद्र सूर्य तारांगणें । तो भHांकारणें बाळलीला ॥8॥ लीळा कोण जाणे याचें महिमान । जगाचें जीवन देवादिदेव ॥9॥ देवें कवतुक दाखविलें तयां । लागतील पायां मायबापें ॥10॥ मायबाप ह्मणे हा चि देव खरा । आणीक पसारा लटिका तो ॥11॥ तो हि त्यांचा देव दिला नारायणें । माझें हें करणें तो हि मी च ॥12॥ मीं च ह्मणउनि जें जें जेथें ध्याती । तेथें मी श्रीपति भोगिता तें ॥13॥ तें मज वेगळें मी तया निराळा । नाहीं या सकळा ब्रह्मांडांत ॥14॥ ततभावना तैसें भविष्य तयाचें । फळ देता साचें मी च एक ॥15॥ मी च एक खरा बोलें नारायण । दाविलें निर्वाण निजदासां ॥16॥ निजदासां खूण दाविली निरुती । तुका ह्मणे भूतीं नारायण ॥17॥ 4511 नारायण भूतीं न कळे जयांसि । होय गर्भवासीं येणें जाणें ॥1॥ येणें जाणें होय भूतांच्या मत्सरें । न कळतां खरें देव ऐसा ॥2॥ देव ऐसा जया कळला सकळ । गेली तळमळ द्वेषबुिद्ध॥3॥ बुद्धीचा पालट नव्हे कोणे काळीं । हरि जळीं स्थळीं तया चित्तीं ॥4॥ चित्त तें निर्मळ जैसें नवनीत । जाणिजे अनंत तयामाजी ॥5॥ तयामाजी हरि जाणिजे त्या भावें । आपलें परावें सारिखें चि ॥6॥ चिंतनें तयाच्या तरती आणीक । जो हें सकिळक देव देखे ॥7॥ देव देखे तो ही कसा देव नव्हे । उरला संदेहे काय त्यासि ॥8॥ काया वाचा मनें पूजावे वैष्णव । ह्मणउनि भाव धरूनियां ॥9॥ यांसि कवतुक दाखविलें रानीं । वोणवा गिळूनि गोपाळांसि ॥10॥ गोपाळांसि डोळे झांकविले हातें । धरिलें अनंतें विश्वरूप ॥11॥ पसरूनि मुख गििळयेलें ज्वाळ । पहाती गोपाळ बोटां सांदी ॥12॥ संधि सारूनियां पाहिलें अनंता । ह्मणती ते आतां कळलांसी ॥13॥ कळला हा तुझा देह नव्हे देवा । गििळला वोणवा आणीक तो ॥14॥ तो तयां कळला आरुषां गोपाळां । दुर्गम सकळां साधनांसि ॥15॥ सीण उरे तुका ह्मणे साधनाचा । भाविकांसि साचा भाव दावी ॥16॥ 4512 भाव दावी शुद्ध देखोनियां चित्त । आपल्या अंकित निजदासां ॥1॥ सांगे गोपाळांसि काय पुण्य होतें । वांचलों जळते आगी हातीं ॥2॥ आजि आह्मां येथें राखियेलें देवें । नाहीं तरी जीवें न वंचतों ॥3॥ न वंचत्या गाइऩ जळतों सकळें । पूर्वपुण्यबळें वांचविलें ॥4॥ पूर्वपुण्य होतें तुमचिये गांठी । बोले जगजेठी गोपाळांसि ॥5॥ गोपाळांसि ह्मणे वैकुंठनायक । भले तुह्मी एक पुण्यवंत ॥6॥ करी तुका ह्मणे करवी आपण । द्यावें थोरपण सेवकांसि ॥7॥ 4513 काय आह्मां चाळविसी वायांविण । ह्मणसी दुरून देखिलासि ॥1॥ लावूनियां डोळे नव्हतों दुिश्चत । तुज परचित्त माव होती ॥2॥ होती दृिष्ट आंत उघडी आमची । बाहेरी ते वांयां चि कुंची झाकुं ॥3॥ जालासि थोरला थोरल्या तोंडाचा । गििळयेला वाचा धूर आगी ॥4॥ आगी खातो ऐसा आमचा सांगाती । आनंदें नाचती भोंवताली ॥5॥ भोंवतीं आपणा मेळविलीं देवें । तुका ह्मणे ठावें नाहीं Yाान ॥6॥ 4514 नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥1॥ जाणतियां सवें येऊं नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले॥2॥ वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनियां दूर दुराविले ॥3॥ दुरावले दूर आशाबद्ध देवा । करितां या सवा कुटुंबाची ॥4॥ चित्तीं द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥5॥ नरक साधिले विसरोनि देवा । बुडाले ते भवा नदीमाजी ॥6॥ जीहीं हरिसंग केला संवसारीं । तुका ह्मणे खरी खेप त्यांची ॥7॥ 4515 खेळींमेळीं आले घरा गोपीनाथ । गोपाळांसहित मातेपाशीं ॥1॥ मातेपाशीं एक नवल सांगती । जाली तैसी ख्याती वोणव्याची ॥2॥ ओवािळलें तिनें करूनि आरती । पुसे दसवंती गोपाळांसि ॥3॥ पुसे पडताळुनी मागुती मागुती । गोपाळ सांगती कवतुक ॥4॥ कवतुका कानीं आइकतां त्यांचे । बोलतां ये वाचे वीट नये ॥5॥ नयन गुंतले श्रीमुख पाहतां । न साहे लवतां आड पातें ॥6॥ तेव्हां कवतुक कळों आलें कांहीं । हळुहळु दोहीं मायबापां ॥7॥ हळुहळु त्यांचें पुण्य जालें वाड । वारलें हें जाड तिमिराचें ॥8॥ तिमिर हें तेथें राहों शके कैसें । जालियां प्रकाशें गोविंदाच्या ॥9॥ दावी तुका ह्मणे देव ज्या आपणा । पालटे तें क्षणामाजी एका ॥10॥ 4516 काय आतां यासि ह्मणावें लेंकरूं । जगाचा हा गुरु मायबाप ॥1॥ माया याची यासि राहिली व्यापून । कळों नये क्षण एक होतां ॥2॥ क्षण एक होतां विसरलीं त्यासि । माझेंमाझें ऐसें करी बाळा ॥3॥ करी कवतुक कळों नेदी कोणा । योजूनि कारणा तें चि खेळे ॥4॥ तें सुख लुटिलें घरिचिया घरीं । तुका ह्मणे परी आपुलाल्या ॥5॥ 4517 आपुलाल्यापरी करितील सेवा । गीत गाती देवा खेळवूनि ॥1॥ खेळु मांडियेला यमुने पाबळीं । या रे चेंडुफळी खेळूं आतां ॥2॥ आणविल्या डांगा चवगुणां काठी । बैसोनिया वांटी गडिया गडी ॥3॥ गडी जंव पाहे आपणासमान । नाहीं नारायण ह्मणे दुजा ॥4॥ जाणोनि गोविंदें सकळांचा भाव । तयांसि उपाव तो चि सांगे ॥5॥ सांगे सकळांसि व्हा रे एकीकडे । चेंडू राखा गडे तुह्मी माझा ॥6॥ मज हा न लगे आणीक सांगाती । राखावी बहुतीं हाल माझी ॥7॥ माझे हाके हाक मेळवा सकळ । नव जा बरळ एकमेकां ॥8॥ एका समतुकें अवघेचि राहा । जाइऩल तो पाहा धरा चेंडू ॥9॥ चेंडू धरा ऐसें सांगतो सकळां । आपण निराळा एकला चि ॥10॥ चिंडुनियां चेंडू हाणे ऊर्ध्वमुखें । ठेलीं सकिळक पाहात चि ॥11॥ पाहात चि ठेलीं न चलतां कांहीं । येरू लवलाहीं ह्मणे धरा ॥12॥ धरावा तयानें त्याचें बळ ज्यासि। येरा आणिकांसि लाग नव्हे ॥13॥ नव्हे काम बळ बुिद्ध नाहीं त्याचें । न धरवे निंचें उंचाविण ॥14॥ विचारीं पडिले देखिले गोपाळ । या ह्मणे सकळ मजमागें ॥15॥ मार्ग देवाविण न दिसे आणिका । चतुर होत का बहुत जन ॥16॥ चतुर चिंतिती बहुत मारग । हरि जाय लाग पाहोनियां ॥17॥ या मागें जे गेले गोविंदा गोपाळ । ते नेले सीतळ पंथ ठायां ॥18॥ पंथ जे चुकले आपले मतीचे । तयांमागें त्यांचे ते चि हाल ॥19॥ हाल दोघां एक मोहरां मागिलां । चालतां चुकलां वाट पंथ ॥20॥ पंथ पुढिलांसी चालतां न कळे । मागिलांनीं डोळे उघडावे ॥21॥ वयाचा प्रबोध विचार ज्या नाहीं । समान तो देहीं बाळकांसी ॥22॥ सिकविलें हित नायिके जो कानीं । त्यामागें भल्यांनीं जाऊं नये ॥23॥ नये तें चि करी श्रेष्ठाचिया मना । मूर्ख एक जाणा तो चि खरा ॥24॥ रानभरी जाले न कळे मारग । मग तो श्रीरंग आठविला ॥25॥ लाज सांडूनियां मारितील हाका । कळलें नायका वैकुंठींच्या ॥26॥ चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणीती । तया अति प्रीति गोपाळांची॥27॥ गोपाळांचा धांवा आइकिला कानीं । सोयी चक्रपाणि पालविलें॥28॥ साया धरूनियां आले हरिपासीं । लहान थोरांसी सांभािळलें ॥29॥ सांभािळलें तुका ह्मणे सकळ हि । सुखी जाले ते ही हरिमुखें॥30॥ 4518 मुखें सांगे त्यांसि पैल चेंडू पाहा । उदकांत डोहाचिये माथां ॥1॥ माथां कळंबाचे अवघडा ठायीं । दावियेला डोहीं जळामाजी ॥2॥ जळांत पाहातां हाडति या दृिष्ट । ह्मणे जगजेठी ऐसें नव्हे ॥3॥ नव्हे साच चेंडू छाया दिसे आंत । खरा तेथें चित्त लावा वरी ॥4॥ वरी देखियेला अवघ्यांनीं डोळां । ह्मणती गोपाळा आतां कैसें ॥5॥ कैसें करूनियां उतरावा खालीं । देखोनियां भ्यालीं अवघीं डोहो ॥6॥ डोहो बहु खोल काळया भीतरी । सरलीं माघारीं अवघीं जणें ॥7॥ जयाचें कारण तयासी च ठावें । पुसे त्याच्या भावें त्यास हरि ॥8॥ त्यासि नारायण ह्मणे राहा तळीं । चढे वनमाळी झाडावरी ॥9॥ वरि जातां वरि पाहाती गोपाळ । ह्मणति सकळ आह्मी नेणों ॥10॥ नेणों ह्मणती हें करितोसि काइऩ। आह्मां तुझी आइऩ देइल सिव्या ॥11॥ आपुलिया कानां देउनियां हात । सकळीं निमित्य टािळयेलें ॥12॥ निमित्याकारणें रचिलें कारण । गेला नारायण खांदीवरी ॥13॥ खांदीवरी पाव ठेवियेला देवें । पाडावा त्या भावें चेंडू तळीं ॥14॥ तळील नेणती तुका ह्मणे भाव । अंतरींचा देव जाणों नेदी ॥15॥ 4519 नेदी कळों केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ॥1॥ न पुरेसा हात घाली चेंडूकडे । ह्मणीतलें गडे सांभाळावें ॥2॥ सांभाळ करितां सकळां जिवांचा । गोपाळांसि वाचा ह्मणे बरें ॥3॥ बरें विचारुनी करावें कारण । ह्मणे नारायण ब†या बरें ॥4॥ बरें ह्मणउनि तयांकडे पाहे । सोडविला जाय चेंडू तळा ॥5॥ तयासवें उडी घातली अनंतें । गोपाळ रडते येती घरा ॥6॥ येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरीं सकळ आलीं पुढें ॥7॥ पुसतील मात आपआपल्यासि । हरिदुःखें त्यांसी न बोलवे ॥8॥ न बोलवे हरि बुडालासें मुखें । कुटितील दुःखें उर माथे ॥9॥ मायबापें तुका ह्मणे न देखती । ऐसें दुःख चित्तीं गोपाळांच्या ॥10॥ 4520 गोपाळां उभडु नावरे दुःखाचा । कुंटित हे वाचा जाली त्यांची ॥1॥ जालें काय ऐसें न कळे कोणासी । ह्मणती तुह्मांपासीं देव होता ॥2॥ देवासवें दुःख न पवते ऐसें । कांहीं अनारिसें दिसे आजी ॥3॥ आजि दिसे हरि फांकला यांपाशीं । ह्मणउनि ऐशी परि जाली ॥4॥ जाणविल्याविण कैसें कळे त्यांसि। शाहाणे तयांसि कळों आले ॥5॥ कळों आलें तीहीं काुंफ्द शांत केला । ठायींचा च त्यांला थोडा होता ॥6॥ होता तो विचार सांगितला जना । गोपाळ शाहाणा होता त्याणें ॥7॥ सांगे आतां हरि तुह्मां आह्मां नाहीं । बुडाला तो डोहीं यमुनेच्या ॥8॥ यासी अवकाश नव्हे चि पुसतां । जालिया अनंता कोण परि ॥9॥ परि त्या दुःखाची काय सांगों आतां । तुका ह्मणे माता लोकपाळ॥10॥ 4521 पाषाण फुटती तें दुःख देखोनि । करितां गौळणी शोक लोकां ॥1॥ काय ऐसें पाप होतें आह्मांपासीं । बोलती एकासी एक एका ॥2॥ एकांचिये डोळां असुं बाहएात्कारी । नाहीं तीं अंतरीं जळतील ॥3॥ जळतील एकें अंतर्बाहएात्कारें । टाकिलीं लेकुरें कडियेहूनि ॥4॥ निवांत चि एकें राहिलीं नििंश्चत । बाहेरी ना आंत जीव त्यांचे ॥5॥ त्यांचे जीव वरी आले त्या सकळां । एका त्या गोपाळांवांचूनियां ॥6॥ वांचणें तें आतां खोटें संवसारीं । नव्हे भेटी जरी हरिसवें ॥7॥ सवें घेऊनियां चालली गोपाळां । अवघीं च बाळा नर नारी ॥8॥ नर नारी नाहीं मनुष्याचें नावें । गोकुळ हें गांव सांडियेलें ॥9॥ सांडियेलीं अन्नें संपदा सकळ । चित्तीं तो गोपाळ धरुनि जाती ॥10॥ तिरीं माना घालूनियां उभ्या गाइऩ । तटस्थ या डोहीं यमुनेच्या ॥11॥ यमुनेच्या तिरीं झाडें वृक्ष वल्ली। दुःखें कोमाइलीं कृष्णाचिया ॥12॥ यांचें त्यांचें दुःख एक जालें तिरीं । मग शोक करी मायबाप ॥13॥ मायबाप तुका ह्मणे सहोदर । तोंवरी च तीर न पवतां ॥14॥ 4522 तीर देखोनियां यमुनेचें जळ । कांठीं च कोल्हाळ करिताती ॥1॥ कइवाड नव्हे घालावया उडी । आपणासि ओढी भय मागें ॥2॥ मागें सरे माय पाउला पाउलीं । आपल्या च घाली धाकें अंग ॥3॥ अंग राखोनियां माय खेद करी । अंतरीचें हरी जाणवलें ॥4॥ जाणवलें मग देवें दिली बुडी । तुका ह्मणे कुडी भावना हे ॥5॥ 4523 भावनेच्या मुळें अंतरला देव । शिरला संदेह भयें पोटीं ॥1॥ पोटीं होतें मागें जीव द्यावा ऐसें । बोलिल्या सरिसें न करवे ॥2॥ न करवे त्याग जीवाचा या नास । नारायण त्यास अंतरला ॥3॥ अंतरला बहु बोलतां वाउगें । अंतरींच्या त्यागेंविण गोष्टी ॥4॥ गोष्टी सकळांच्या आइकिल्या देवें । कोण कोण्याभावें रडती तीं ॥5॥ तीं गेलीं घरास आपल्या सकळ । गोधनें गोपाळ लोक माय ॥6॥ मायबापांची तों ऐसी जाली गति । तुका ह्मणे अंतीं कळों आलें ॥7॥ 4524 आला यांचा भाव देवाचिया मना । अंतरीं कारणांसाठीं होता ॥1॥ होता भाव त्यांचा पाहोनि निराळा । नव्हता पाताळा गेला आधीं ॥2॥ आधीं पाठीमोरीं जालीं तीं सकळें । मग या गोपाळें बुडी दिली ॥3॥ दिली हाक त्याणें जाऊनि पाताळा । जागविलें काळा भुजंगासि ॥4॥ भुजंग हा होता निजला मंदिरीं । निर्भर अंतरीं गर्वनिधि ॥5॥ गर्व हरावया आला नारायण । मिस या करून चेंडुवाचें ॥6॥ चेंडुवाचे मिसें काळया नाथावा । तुका ह्मणे देवा कारण हें ॥7॥ 4525 काळयाचे मागे चेंडु पत्नीपाशीं । तेजःपुंज राशी देखियेला ॥1॥ लावण्यपूतळा मुखप्रभाराशी । कोटि रवि शशी उगवले ॥2॥ उघवला खांब कदऩळीचा गाभा । ब्रीदें वांकी नभा देखे पायीं ॥3॥ पाहिला सकळ तिनें न्याहाळूनि । कोण या जननी विसंबली ॥4॥ विसरु हा तीस कैसा याचा जाला । जीवाहुनि वाल्हा दिसतसे ॥5॥ दिसतसे रूप गोजिरें लाहान । पाहातां लोचन सुखावले ॥6॥ पाहिलें पताौनि काळा दुष्टाकडे । मग ह्मणे कुडें जालें आतां ॥7॥ आतां हा उठोनि खाइऩल या बाळा । देइऩल वेल्हाळा माय जीव ॥8॥ जीव याचा कैसा वांचे ह्मणे नारी । मोहिली अंतरीं हरिरूपें ॥9॥ रूपे अनंताचीं अनंतप्रकार । न कळे साचार तुका ह्मणे ॥10॥ 4526 ह्मणे चेंडू कोणें आणिला या ठाया । आलों पुरवाया कोड त्याचें ॥1॥ त्याचें आइकोन निष्ठ‍ वचन । भयाभीत मन जालें तीचें ॥2॥ तिची चित्तवृत्ती होती देवावरी । आधीं ते माघारी फिरली वेगीं ॥3॥ वेगीं मन गेलें भ्रताराचे सोयी । विघ्न आलें कांहीं आह्मांवरीं ॥4॥ वरि उदकास अंत नाहीं पार । अक्षोभ सागर भरलासे ॥5॥ संचार करूनि कोण्या वाटे आला । ठायीं च देखिला अवचिता ॥6॥ अवचिता नेणों येथें उगवला । दिसे तो धाकुला बोल मोठे ॥7॥ मोठएानें बोलतो भय नाहीं मनीं । केला उठवूनी काळ जागा ॥8॥ जागविला काळसर्प तये वेळीं । उठिला कल्लोळीं विषाचिये ॥9॥ यमुनेच्या डोहावरी आला ऊत । काऑयाकृतांतधूदकारें ॥10॥ कारणें ज्या येथें आला नारायण । जालें दरुषण दोघांमधीं ॥11॥ दोघांमध्यें जाले बोल परस्परें । प्रसंग उत्तरें युद्धाचिया ॥12॥ चिंतावला चित्तीं तोंडे बोले काळ । करीन सकळ ग्रास तुझा ॥13॥ जाला सावकाश झेंप घाली वरी। तंव ह्मणे हरि मुिष्टघातें ॥14॥ तेणें काळें त्यासि दिसे काळ तैसा। हरावया जैसा जीव जाला ॥15॥ आठवले काळा हाकारिलें गोत । मिळालीं बहुतें नागकुळें ॥16॥ कल्हारीं संधानीं धरियेला हरि । अवघा विखारीं व्यापियेला ॥17॥ यांस तुका ह्मणे नाहीं भHीविण । गरुडाचें चिंतन केलें मनीं ॥18॥ 4527 निजदास उभा तात्काळ पायापें । स्वामी देखे सर्पें वेिष्टयेला ॥1॥ लहानथोरें होतीं मिळालीं अपारें । त्याच्या धुदकारें निवारिलीं ॥2॥ निघतां आपटी धरूनि धांवामधीं । एकाचें चि वधी माथें पायें ॥3॥ एकीं जीव दिले येतां च त्या धाकें । येतील तीं एकें काकूलती ॥4॥ यथेष्ट भिक्षलीं पोट धाये वरी । तंव ह्मणे हरि पुरे आतां ॥5॥ आतां करूं काम आलों जयासाटीं । हरी घाली मिठी काळयासि ॥6॥ यासि नाथूनियां नाकीं दिली दोरी । चेंडू भार शिरीं कमळांचा ॥7॥ चालविला वरी बैसे नारायण । गरुडा आळंगुन बहुडविलें ॥8॥ विसरु न पडे संवगडएा गाइऩ । यमुनेच्या डोहीं लक्ष त्यांचें ॥9॥ त्याच्या गोष्टी कांठीं बैसोनि सांगती । बुडाला दाविती येथें हरि ॥10॥ हरीचें चिंतन करितां आठव । तुका ह्मणे देव आला वरी ॥11॥ 4528 अवचित त्यांणीं देखिला भुजंग । पळतील मग हाउ आला ॥1॥ आला घेऊनियां यमुनेबाहेरी । पालवितो करीं गडियांसि॥2॥ गडियांसि ह्मणे वैकुंठनायक । या रे सकिळक मजपाशीं ॥3॥ मजपाशीं तुह्मां भय काय करी । जविळ या दुरी जाऊं नका ॥4॥ कानीं आइकिले गोविंदाचे बोल । ह्मणती नवल चला पाहों ॥5॥ पाहों आले हरीजवळ सकळ । गोविंदें गोपाळ आिंळगिले ॥6॥ आल्या गाइऩ वरी घालितील माना । वोरसलें स्तना क्षीर लोटें ॥7॥ लोटती सकळें एकावरी एक । होउनि पृथक कुर्वाळलीं ॥8॥ कुर्वाळलीं आनंदें घेती चारापाणी । तिहीं चक्रपाणी देखियेला ॥9॥ त्यां च पाशीं होता परि केली माव । न कळे संदेह पडलिया ॥10॥ याति वृक्ष वल्ली होत्या कोमेलिया । त्यांसि कृष्णें काया दिव्य दिली ॥11॥ दिलें गोविंदें त्या पदा नाहीं नाश। तुका ह्मणे आस निरसली ॥12॥ 4529 आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥1॥ पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥ हाका आरोिळया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥3॥ आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥4॥ लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥5॥ आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥6॥ आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें ॥7॥ 4530 जननी हे ह्मणे आहा काय जालें । शरीर रिक्षलें काय काजें ॥1॥ काय काज आतां हरिविण जिणें । नित्य दुःख कोणें सोसावें हें ॥2॥ हें दुःख न सरे हरि न भेटे तों । त्यामागें चि जातों एका वेळे ॥3॥ एकवेळ जरी देखतें मी आतां । तरी जीवापरता न करितें ॥4॥ करितां हे मात हरीचें चिंतन । शुभ तो शकुन तुका ह्मणे ॥5॥ 4531 शुभ मात तिहीं आणिली गोपाळीं । चेंडू वनमाळी घेउनि आले ॥1॥ आली दारा देखे हरुषाची गुढी । सांगितली पुढी हरुषें मात ॥2॥ हरुषलीं माता केलें निंबलोण । गोपाळांवरून कुरवंडी ॥3॥ गोपाळां भोवतें मिळालें गोकुळ । अवघीं सकळ लहान थोरें ॥4॥ थोर सुख जालें ते काळीं आनंद । सांगती गोविंद वरि आला ॥5॥ आले वरि बैसोनियां नारायण । काळया नाथून वहन केलें ॥6॥ नगराबाहेरी निघाले आनंदें । लावूनियां वाद्यें नाना घोष ॥7॥ नारायणापुढें गोपाळ चालती । आनंदें नाचती गाती गीत ॥8॥ तंव तो देखिला वैकुंठींचा पती । लोटांगणीं जाती सकळ ही ॥9॥ सकळ ही एका भावें आलिंगिले । अवघियां जाले अवघे हरि ॥10॥ हरि आलिंगनें हरिरूप जालीं । आप विसरलीं आपणास ॥11॥ सकळांसी सुख एक दिलें देवें । मायबापां भावें लोकपाळां ॥12॥ मायबाप देवा नाहीं लोकपाळ । सारिखीं सकळ तुका ह्मणे ॥13॥ 4532 नेणें वर्ण धर्म जीं आलीं सामोरीं । अवघीं च हरी आिंळगिलीं ॥1॥ हरि लोकपाळ आले नगरांत । सकळांसहित मायबाप ॥2॥ पारणें तयांचें जालें एका वेळे । देखिलें सावळें परब्रह्म ॥3॥ ब्रह्मानंदें लोक सकळ नाचती । गुढिया उभविती घरोघरीं ॥4॥ घरोघरीं सुख आनंद सोहळा । सडे रंग माळा चौकदारीं ॥5॥ दारीं वृंदावनें तुळसीचीं वनें । रामकृष्णगाणें नारायण॥6॥ नारायण तिहीं पूजिला बहुतीं । नाना पुष्पयाती करूनियां ॥7॥ यांचें ॠण नाहीं फिटलें मागील । पुढें भांडवल जोडिती हीं ॥8॥ हीं नव्हतीं कधीं या देवा वेगळीं । केला वनमाळी सेवाॠणी ॥9॥ सेवाॠणें तुका ह्मणे रूपधारी । भHांचा कैवारी नारायणा ॥10॥ 4533 नारायण आले निजमंदिरासि । जाले या लोकांसि बहुडविते ॥1॥ बहुडविले बहु केलें समाधान । विसरु तो क्षण नका माझा ॥2॥ मात सांगितली सकळ वृत्तांत । केलें दंडवत सकळांनीं ॥3॥ सकळां भातुकें वांटिल्या साखरा । आपलाल्या घरा लोक गेले ॥4॥ लोक गेले कामा गाइऩपें गोपाळ । वारली सकळ लोभापाठी ॥5॥ लोभ दावुनियां आपला विसर । पाडितो कुमर धनआशा ॥6॥ आशेचे बांधले तुका ह्मणे जन । काय नारायण ऐसा जाणे ॥7॥ 4534 जाला कवतुक करितां रोकडें । आणीक ही पुढें नारायण ॥1॥ येउनियां पुढें धरिला मारग । हरावया भाग इंद्रापाशीं॥2॥ इंद्रा दहीं दुध तूप नेतां लोणी । घेतलें हिरोनि वाटे त्यांचें ॥3॥ हिरोनि घेतल्या कावडी सकळा । ह्मणती गोपाळा बरें नव्हे ॥4॥ नव्हे तें चि करी न भे किळकाळा । तुका ह्मणे लीळा खेळे देव ॥5॥ 4535 खेळ नव्हे बरा इंद्र कोपलिया । देव ह्मणे तयां भेऊं नका ॥1॥ नका धरू भय धाक कांहीं मनीं । बोले चक्रपाणि गौिळयांसि ॥2॥ गौिळयांसि धीर नाहीं या वचनें । आशंकितमनें वेडावलीं ॥3॥ वेडावलीं त्यांसि न कळतां भाव । देवआदिदेव नोळखतां ॥4॥ नोळखतां दुःखें वाहाती शरीरीं । तुका ह्मणे वरि भारवाही ॥5॥ 4536 भारवाही नोळखती या अनंता । जवळी असतां अंगसंगें ॥1॥ अंगसंगें तया न कळे हा देव । कळोनि संदेह मागुताला ॥2॥ मागुती पडती चिंतेचिये डोहीं । जयाची हे नाहीं बुिद्ध िस्थर ॥3॥ बुिद्ध िस्थर होउं नेदी नारायण । आशबद्ध जन लोभिकांची ॥4॥ लोभिकां न साहे देवाचें करणें । तुका ह्मणे तेणें दुःखी होती ॥5॥ 4537 दुःखी होती लोभें करावें तें काइऩ । उडतील गाइऩ म्हैसी आतां ॥1॥ आणीकही कांहीं होइऩल अरिष्ट । नायिके हा धीट सांगितलें ॥2॥ सांगों चला याच्या मायबापांपाशीं । निघाले घरासि देवा रागें ॥3॥ रागें काला देतां न घेती कवळ । टोकवी गोपाळ क्रोधियांसि ॥4॥ क्रोध देवावरि धरियेला राग । तुका ह्मणे भाग न लभती ॥5॥ 4538 भाग त्या सुखाचे वांकडएां बोबडएां । आपलिया गडएां भाविकांसि ॥1॥ भारवाही गेले टाकुनि कावडी । नवनीतगोडी भाविकांसि ॥2॥ काला करूनियां वांटिलां सकळां । आनंदें गोपाळांमाजी खेळे ॥3॥ खेळेंमेळें दहीं दुध तूप खाती । भय नाहीं चित्तीं कवणाचें ॥4॥ कवणाचें चाले तुका ह्मणे बळ । जयासी गोपाळ साहए जाला ॥5॥ 4539 जाणवलें इंद्रा चरित्र सकळ । वांकुल्या गोपाळ दाविताती ॥1॥ तातडिया मेघां आYाा करी राव । गोकुळींचा ठाव उरों नेदा ॥2॥ नेदाविया काइऩ म्हसी वांचों लोक । पुरा सकिळक सिळाधारीं ॥3॥ धाक नाहीं माझा गोविळयां पोरां । सकिळक मारा ह्मणे मेघां ॥4॥ ह्मणविती देव आपणां तोंवरी । जंव नाहीं वरी कोपलों मी ॥5॥ मीपणें हा देव न कळे चि त्यांसी । अभिमानें रासि गर्वाचिया ॥6॥ अभिमानरासि जयाचिये ठायीं । तुका ह्मणे तइप देव दुरी ॥7॥ 4540 देव त्यां फावला गोपाळां । नाहीं तेथें कळा अभिमान॥1॥ नाडलीं आपल्या आपण चि एकें । संदेहदायकें बहुफारें ॥2॥ फारें चाळविलीं नेदी कळों माव । देवाआदिदेव विश्वंभर ॥3॥ विश्वासावांचुनि कळों नये खरा । अभHां अधीरा जैसा तैसा ॥4॥ जैसा भाव तैसा जविळ त्या दुरि । तुका ह्मणे हरि देतो घेतो ॥5॥ 4541 तो या साच भावें न कळे चि इंद्रा । ह्मणउनि धारा घाली सिळा ॥1॥ घाली धारा मेघ कडाडिला माथा । वरि अवचिता देखियेला ॥2॥ देखती पाऊस वोळला गोपाळ । भ्याले हे सकळ विचारिती ॥3॥ विचार पडला विसरले खेळ । अन्याय गोपाळ ह्मणती केला ॥4॥ लागलेंसे गोड न कळे ते काळीं । भेणें वनमाळी आठविती ॥5॥ आतां कायकैसा करावा विचार । गोधनासि थार आपणिया ॥6॥ यांचिया विचारें होणार ते काइऩ । तुका ह्मणे ठायीं वेडावलीं ॥7॥ 4542 वेडावलीं काय करावें या काळीं । ह्मणे वनमाळी गोपाळांसि ॥1॥ शिरी धरूं गोवद्धऩन उचलूनि । ह्मणे तुह्मी कोणी भिऊं नका ॥2॥ नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोिळया ॥3॥ अशंकित चित्तें न वटे त्यां खरें । धाकें च ते बरें ह्मणती चला ॥4॥ चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका ह्मणे घात होऊं नेदी ॥5॥ 4543 नेदी दुःख देखों दासा नारायण । ठेवी निवारून आल्या आधीं ॥1॥ आधीं पुढें शुद्ध करावा मारग । दासांमागें मग सुखरूप ॥2॥ पर्वतासि हात लाविला अनंतें । तो जाय वरतें आपेंआप ॥3॥ आपल्याआपण उचलिला गिरी । गोपाळ हे करी निमित्यासि ॥4॥ निमित्य करूनि करावें कारण । करितां आपण कळों नेदी ॥5॥ दिनाचा कृपाळु पतितपावन । हें करी वचन सांच खरें ॥6॥ सांगणें न लगे सुखदुःख दासा । तुका ह्मणे ऐसा कृपावंत ॥7॥ 4544 कृपावंतें हाक दिली सकिळकां । माजिया रे नका राहों कोणी ॥1॥ निघाले या भेणे पाउसाच्या जन । देखे गोवद्धऩन उचलिला ॥2॥ लाविले गोपाळ फेरीं चहूंकडे । हांसे काुंफ्दे रडे कोणी धाकें ॥3॥ धाकें हीं सकळ निघालीं भीतरी । उचलिला गिरी तयाखालीं ॥4॥ तयाखालीं गाइऩ वत्सें आलीं लोक । पक्षी सकिळक जीवजाति ॥5॥ जिहीं ह्मणविलें हरीचे अंकित । जातीचे ते होत कोणी तरी ॥6॥ जाति कुळ नाहीं तयासि प्रमाण । अनन्या अनन्य तुका ह्मणे ॥7॥ 4545 त्यांसि राखे बळें आपुले जे दास । किळकाळासि वास पाहों नेदी ।1॥ पाउस न येतां केली यांची थार । लागला तुषार येऊं मग ॥2॥ येउनि दगड बैसतील गिरी । वरुषला धारीं शिळांचिये ॥3॥ शिळांचिये धारीं वरुषला आकांत । होता दिवस सात एक सरें ॥4॥ एक सरें गिरि धरिला गोपाळीं । होतों भाव बळी आह्मी ऐसे ॥5॥ ऐसें कळों आलें देवाचिया चित्ता । ह्मणे तुह्मीं आतां हात सोडा ॥6॥ हांसती गोपाळ करूनि नवल । आइकोनि बोल गोविंदाचे ॥7॥ दावितील डोया गुडघे कोपर । फुटले ते भार उचलितां ॥8॥ भार आह्मांवरि घालुनि निराळा । राहिलासी डोळा चुकवुनि ॥9॥ निमित्य अंगुळी लावियेली बरी । पाहों कैसा गिरी धरितोसि ॥10॥ सिणले हे होते ठायींच्या त्या भारें । लटिकें चि खरें मानुनियां ॥11॥ यांणीं अंत पाहों आदरिला याचा । तुका ह्मणे वाचा वाचाळ ते ॥12॥ 4546 वाचाळ लटिके अभH जे खळ । आपुलें तें बळ वाखाणीती ॥1॥ बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधऑयांचे ॥2॥ आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥3॥ लटिका चि आह्मीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥4॥ आलें कळों तुका ह्मणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥5॥ 4547 सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं॥1॥ लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण ह्मणे भलें ॥2॥ भला आजि तुह्मी केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥3॥ लागती चरणा सकळ ते काळीं । आह्मांमध्यें बळी तूं चि एक ॥4॥ एका तुजविण न यों आह्मी कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥5॥ आजिवरि आह्मां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥6॥ तुझा पार आह्मी नेणों नारायणा । नखीं गोवद्धऩना राखियेलें ॥7॥ राखियेलें गोकुळ आह्मां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥8॥ वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकिळक ॥9॥ सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥10॥ त्यासि कळों आला वैकुंठनायका। तुका ह्मणे लोक निर्भर ते ॥11॥ 4548 लोकां कळों आला देव आह्मांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥1॥ शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥2॥ मग मनीं जाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥3॥ कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त जालें त्यांचें ॥4॥ त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख जालें ॥6॥ सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥6॥ चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका ह्मणे मनीं समाधान ॥7॥ 4549 समाधान त्यांचीं इंिद्रयें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥1॥ गोविंदाचा जाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काज ॥2॥ काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥3॥ माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरि दिसों नेदी ॥4॥ दिसे तया आप परावें सारिखें । तुका ह्मणे सुखें कृष्णाचिया ॥5॥ 4550 कृष्णाचिया सुखें भुक नाहीं तान । सदा समाधान सकळांचें ॥1॥ कळलें चि ऩाहीं जाले किती दिस । बाहेरिल वास विसरलीं ॥2॥ विसरु कामाचा तुका ह्मणे जाला । उद्वेग राहिला जावें यावें ॥3॥ 4551 जावें बाहेरी हा नाठवे विचार । नाहीं समाचार ठावा कांहीं ॥1॥ कांहीं न कळे तें कळों आलें देवा । मांडिला रिघावा कवतुक ॥2॥ कवतुकासाठीं भH देहावरि । आणिताहे हरि बोलावया॥3॥ यासि नांव रूप नाहीं हा आकार । कळला साचार भHा मुखें ॥4॥ मुखें भHांचिया बोलतो आपण । अंगसंगें भिन्न नाहीं दोघां ॥5॥ दोघे वेगळाले लेखिल जो कोणी । तयाचा मेदिनी बहु भार ॥6॥ तयासी घडलीं सकळ ही पापें । भHांचिया कोपें निंदा द्वेषें ॥7॥ द्वेषियाचा संग न घडावा कोणा । विष जेंवी प्राणां नाश करी ॥8॥ करितां आइके निंदा या संतांची । तया होती ते चि अधःपात ॥9॥ पतन उद्धार संगाचा महिमा । त्यजावें अधमा संत सेवीं ॥10॥ संतसेवीं जोडे महालाभरासी । तुका ह्मणे यासि नाश नाहीं ॥11॥ 4552 नाहीं नाश हरि आठवितां मुखें । जोडतील सुखें सकळ ही ॥1॥ सकळी ही सुखें वोळलीं अंतरीं । मग त्याबाहेरी काय काज ॥2॥ येऊं विसरलीं बाहेरी गोपाळें । तल्लीन सकळें कृष्णसुखें ॥3॥ सुख तें योगियां नाहीं समाधीस । दिलें गाइऩ वत्स पशु जीवां ॥4॥ वारला पाऊस केव्हां नाहीं ठावा । तुका ह्मणे देवावांचूनियां ॥5॥ 4553 यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा ह्मणे देव ॥1॥ देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥2॥ दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥3॥ नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥4॥ एवढें भHांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका ह्मणे ॥5॥ 4554 काकुलती एकें पाहाती बाहेरी । तया ह्मणे हरि वोसरला ॥1॥ वोसरला मेघ आला होता काळ । बाहेरी सकळ आले लोक ॥2॥ कवतुक जालें ते काळीं आनंद । कळला गोविंद साच भावें ॥3॥ भावें तयापुढें नाचती सकळें । गातील मंगळें ओंव्या गीत ॥4॥ गीत गाती ओंव्या रामकृष्णावरी । गोपाळ मोहोरी वाती पांवे ॥5॥ वत्सें गाइऩ पशू नाचती आनंदें । वेधलिया छंदें गोविंदाच्या ॥6॥ चित्त वेधियेलें गोविंदें जयाचें । कोण तें दैवाचें तयाहुनि ॥7॥ तयाहुनि कोणी नाहीं भाग्यवंत । अखंड सांगात गोविंदाचा ॥8॥ गोविंदाचा संग तुका ह्मणे ध्यान । गोविंद ते जन गोकुळींचे ॥9॥ 4555 गोकुळींची गती कोण जाणे परि । पाहों आला वरी इंद्रराव ॥1॥ इंद्रापाशीं मेघ बोलती बडिवार । सकळ संहार करुनि आलों ॥2॥ आतां जीव नाहीं सांगाया ते रानीं । पुरिलें पाषाणीं शिळाधारीं ॥3॥ रिता कोठें नाहीं राहों दिला ठाव । जल्पती तो भाव न कळतां ॥4॥ न कळतां देव बळें हुंबरती । साच ते पावती अपमान ॥5॥ माव न कळतां केली तोंडपिटी । इंद्र आला दृष्टी पाहावया ॥6॥ पाहतां तें आहे जैसें होतें तैसें । नाचती विशेषें तुका ह्मणे ॥7॥ 4556 नाचतां देखिलीं गाइऩ वत्सें जन । वििस्मत होऊन इंद्र ठेला ॥1॥ लागला पाऊस शिळांचिये धारीं । वांचलीं हीं परी कैसीं येथें ॥2॥ येथें आहे नारायण संदेह नाहीं । विघ्न केलें ठायीं निविऩघ्न तें ॥3॥ विचारितां उचलिला गोवद्धऩन । अवतार पूर्ण कळों आला ॥4॥ आला गौिळयांच्या घरा नारायण । करितो स्तवन इंद्र त्यांचें ॥5॥ त्यांच्या पुण्या पार कोण करी लेखा । न कळे चतुर्मुखा ब्रह्मयासि ॥6॥ सीणतां जो ध्याना न ये एकवेळा । तो तया गोपाळां समागमें ॥7॥ समागमें गाइऩ वत्स पुण्यवंता । देह कुर्वािळतां अंगसंग ॥8॥ संग जाला मायबापां लोकपाळां । आिंळगिती गळा कंठाकंठ ॥9॥ करिते हे जाले स्तुती सकिळक । देव इंद्रादिक गोविंदाची ॥10॥ करितील वृष्टी पुष्पवरुषाव । देवआदिदेव पूजियेला॥11॥ पुष्पांजुळी मंत्र घोष जयजयकार । दुमदुमी अंबर नेणें नादें ॥12॥ नामाचे गजर गंधर्वांचीं गाणीं । आनंद भुवनीं न माये तो ॥13॥ तो सुखसोहळा अनुपम्य रासी । गोकुळीं देवासी दोहीं ठायीं ॥14॥ दोहीं ठायीं सुख दिलें नारायणें । गेला दरुषणें वैरभाव ॥15॥ भावना भेदाची जाय उठाउठी । तुका ह्मणे भेटी गोविंदाचे ॥16॥ 4557 गोविंदाचें नाम गोड घेतां वाचे । तेथें हे कइंचे वैरभाव ॥1॥ भावें नमस्कार घातले सकळीं । लोटांगणें तळीं महीवरि ॥2॥ वरि हातबाहे उभारिली देवें । कळलीया भावें सकळांच्या॥3॥ सकळ ही वरि बहुडविले स्थळा । चलावें गोपाळा ह्मणे घरा ॥4॥ राहिलीं हीं नाचों गोविंदाच्या बोलें । पडिलीया डोलें छंदें हो तीं ॥5॥ छंद तो नावरे आपणा आपला । आनंदाचा आला होता त्यांसि ॥6॥ त्यांच्या तुका ह्मणे आनंदें सकळ । ठेंगणें गोपाळ समागमें ॥7॥ 4558 समागमें असे हरि नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥1॥ अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकिळकां ॥2॥ सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥3॥ सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥4॥ त्यां जाला निर्धार हरि आह्मांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥5॥ निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकिळक नारायणें ॥6॥ नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका ह्मणे नांवा अनुसरे त्या ॥7॥ 4559 ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे॥1॥ हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥2॥ आहे तुका ह्मणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार॥3॥ 4560 अवतार केला संहारावे दुष्ट । करिती हे नष्ट परपीडा॥1॥ परपीडा करी दैत्य कंसराव । पुढें तो ही भाव आरंभिला ॥2॥ लाविलें लाघव पाहोनियां संधी । सकळांही वधी दुष्टजना ॥3॥ दुष्टजन परपीडक जे कोणी । ते या चक्रपाणी न साहति ॥4॥ न साहवे दुःख भHांचें या देवा । अवतार घ्यावा लागे रूप ॥5॥ रूप हें चांगलें रामकृष्ण नाम । हरे भवश्रम उच्चारितां ॥6॥ उच्चारितां नाम कंस वैरभावें । हरोनियां जीवें कृष्ण केला ॥7॥ कृष्णरूप त्यासि दिसे अवघें जन । पाहे तों आपण कृष्ण जाला ॥8॥ पाहिलें दर्पणीं आधील मुखासि । चतुर्भुज त्यासि तो चि जाला ॥9॥ जालीं कृष्णरूप कन्या पुत्र भाज । तुका ह्मणे राज्य सैन्य जन ॥10॥ 4561 सैन्य जन हांसे राया जालें काइऩ । वासपे तो ठायीं आपणासि ॥1॥ आपणा आपण जयास तीं तैसीं । वैरभाव ज्यांसि भिH नाहीं ॥2॥ नाहीं याचा त्याचा भाव एकविध । ह्मणउनि छंद वेगळाले ॥3॥ वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसती अवघीं हरि ॥4॥ हरिला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका ह्मणे ॥5॥ 4562 द्वेषाचिया ध्यानें हरिरूप जाले । भाव हारपले देहादिक॥1॥ देहादिक कर्में अभिमान वाढे । तया कंसा जोडे नारायण ॥2॥ नारायण जोडे एकविध भावें । तुका ह्मणे जीवें जाणें लागे ॥3॥ 4563 जीवभाव त्याचा गेला अभिमान । ह्मणऊनि जन हांसे कंसा ॥1॥ सावध करितां नये देहावरि । देखोनियां दुरि पळे जन ॥2॥ जन वन हरि जालासे आपण । मग हे लोचन झांकियेले॥3॥ झांकुनि लोचन मौन्यें चि राहिला । नाहीं आतां बोलायाचें काम ॥4॥ बोलायासि दुजें नाहीं हें उरलें । जन कृष्ण जाले स्वयें रूप ॥5॥ रूप पालटलें गुण नाम याति । तुका ह्मणे भूतीं देव जाला ॥6॥ 4564 जालों स्वयें कृष्ण आठव हा चित्तीं । भेद भयवृित्त उरली आहे ॥1॥ उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥2॥ तोंवरि हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तो चि देव ॥3॥ देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥4॥ भेदें तुका ह्मणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥5॥ 4565 वांयां तैसे बोल हरिशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥1॥ भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा जाली ॥2॥ जाली भेटी कंसा हरिशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥3॥ येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥4॥ त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका ह्मणे सत्तानायक हा ॥5॥ 4566 नारायणें कंस चाणूर मदिला । रार्ज्यीं बैसविला उग्रसेन ॥1॥ उग्रसेन स्थापियेला शरणागत । पुरविला अंत अभHाचा॥2॥ अवघें चि केलें कारण अनंतें । आपुलिया हातें सकळ ही ॥3॥ सकळ ही केलीं आपुलीं अंकित । राहे गोपीनाथ मथुरेसि ॥4॥ मथुरेसि आला वैकुंठनायक । जालें सकिळक एक राज्य ॥5॥ राज्य दिलें उग्रसेना शरणागता । सोडविलीं माता पिता दोन्हीं ॥6॥ सोडवणे धांवे भHाच्या कैवारें । तुका ह्मणे करें शस्त्र धरी ॥7॥ 4567 धरी दोही ठायीं सारखा चि भाव । देवकी वसुदेव नंद दोघे ॥1॥ दोन्ही एके ठायीं केल्या नारायणें । वाढविला तिणें आणि व्याली ॥2॥ व्याला वाढला हा आपल्या आपण । निमित्या कारणें मायबापा ॥3॥ माय हा जगाची बाप नारायणा । दुजा करी कोण यत्न यासि ॥4॥ कोण जाणे याचे अंतरींचा भाव । कळों नेदी माव तुका ह्मणे ॥5॥ 4568 दिनाचा कृपाळु दुष्टजना काळ । एकला सकळ व्यापक हा ॥1॥ हांसे बोले तैसा नव्हे हा अनंत । नये पराकृत ह्मणों यासि ॥2॥ यासि कळावया एक भिHभाव । दुजा नाहीं ठाव धांडोिळतां ॥3॥ धांडोिळतां श्रुति राहिल्या नििश्चत । तो करी संकेत गोपींसवें ॥4॥ गोपिकांची वाट पाहे द्रुमातळीं । मागुता न्याहाळी न देखतां ॥5॥ न देखतां त्यांसि उठे बैसे पाहे । वेडावला राहे वेळोवेळां ॥6॥ वेळोवेळां पंथ पाहे गोपिकांचा । तुका ह्मणे वाचा नातुडे तो ॥7॥ 4569 तो बोले कोमळ निष्ठ‍ साहोनि । कोपतां गौळणी हास्य करी ॥1॥ करावया दास्य भHांचें निर्लज्ज । कवतुकें रज माथां वंदी ॥2॥ दिलें उग्रसेना मथुरेचें राज्य । सांगितलें काज करी त्याचें ॥3॥ त्यासि होतां कांहीं अरिष्टनिर्माण । निवारी आपण शरणागता ॥4॥ शरणागतां राखे सर्व भावें हरि । अवतार धरी तयांसाटीं ॥5॥ तयांसाटीं वाहे सुदर्शन गदा । उभा आहे सदा सांभािळत ॥6॥ तळमळ नाहीं तुका ह्मणे चित्ता । भHांचा अनंता भार माथां ॥7॥ 4570 मारिले असुर दाटले मेदिनी । होते कोणाकोणी पीडित ते ॥1॥ ते हा नारायण पाठवी अघोरा । संतांच्या मत्सरा घातावरी ॥2॥ वरिले ते दूतीं यमाचिया दंडीं । नुच्चरितां तोंडीं नारायण ॥3॥ नारायण नाम नावडे जयासि । ते जाले मिरासी कुंभपाकीं ॥4॥ कुंभपाकीं सेल मान तो तयांचा । तुका ह्मणे वाचा संतनिंदा ॥5॥ 4571 वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥1॥ ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥2॥ लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥3॥ देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥4॥ येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥5॥ काया वाचा मन कृष्णीं रत जालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥6॥ ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका ह्मणे चित्तीं ॥7॥ 4572 चिंतले पावलीं जयां कृष्णभेटी । एरवीं ते आटी वांयांविण ॥1॥ वासना धरिती कृष्णाविणें कांहीं । सीण केला तिहीं साधनांचा ॥2॥ चाळविले डंबें एक अहंकारें । भोग जन्मांतरें न चुकती ॥3॥ न चुकती भोग तपें दानें व्रतें । एका त्या अनंतेंवांचूनियां॥4॥ चुकवुनि जन्म देइऩल आपणा । भजा नारायणा तुका ह्मणे ॥5॥ 4573 भजल्या गोपिका सर्व भावें देवा । नाहीं चित्तीं हेवा दुजा कांहीं ॥1॥ दुजा छंदु नाहीं तयांचिये मनीं । जागृति सपनीं कृष्णध्यान ॥2॥ ध्यान ज्यां हरीचें हरीसि तयांचें । चित्त ग्वाही ज्यांचें तैशा भावें ॥3॥ भाग्यें पूर्वपुण्यें आठविती लोक । अवघे सकिळक मथुरेचे ॥4॥ मथुरेचे लोक सुखी केले जन । तेथें नारायण राज्य करी ॥5॥ राज्य करी गोपीयादवांसहित । कमिऩलें बहुतकाळ तेथें ॥6॥ तेथें दैत्यीं उपसर्ग केला लोकां । रचिली द्वारका तुका ह्मणे ॥7॥ 4574 रचियेला गांव सागराचे पोटीं । जडोनि गोमटीं नानारत्नें ॥1॥ रत्न खणोखणी सोनियाच्या भिंती । लागलिया ज्योति रविकळा ॥2॥ कळा सकळ ही गोविंदाचे हातीं । मंदिरें निगुतीं उभारिलीं ॥3॥ उभारिलीं दुगॉ दारवंठे फांजी । कोटी चर्या माजी शोभलिया ॥4॥ शोभलें उत्तम गांव सागरांत । सकळांसहित आले हरि ॥5॥ आला नारायण द्वारका नगरा । उदार या शूरा मुगुटमणि ॥6॥ निवडीना याति समान चि केलीं । टणक धाकुलीं नारायणें ॥7॥ नारायणें दिलीं अक्षइऩ मंदिरें । अभंग साचारें सकळांसि॥8॥ सकळ ही धर्मशीळ पुण्यवंत । पवित्र विरH नारीनर ॥9॥ रचिलें तें देवें न मोडे कवणा । बिळयांचा राणा नारायण ॥10॥ बळबुद्धीनें तीं देवा च सारिखीं । तुका ह्मणे मुखीं गाती ओंव्या ॥11॥ 4575 गाती ओंव्या कामें करितां सकळें । हालवितां बाळें देवावरि ॥1॥ ॠिद्धसिद्धी दासी दारीं ओळंगती । सकळ संपित्त सर्वां घरीं ॥2॥ घरीं बैसलिया जोडलें निधान । करिती कीर्त्तन नरनारी ॥3॥ नारीनर लोक धन्य त्यांची याति । जयांसि संगति गोविंदाची ॥4॥ गोविंदें गोविंद केले लोकपाळ । चिंतनें सकळ तुका ह्मणे ॥5॥ 4576 कांहीं चिंता कोणा नाहीं कोणेविशीं । करी द्वारकेसि राज्य देव ॥1॥ द्वारकेसि राज्य करी नारायण । दुष्ट संहारून धर्म पाळी ॥2॥ पाळी वेदआYाा ब्राह्मणांचा मान । अतीतपूजन वैष्णवांचें॥3॥ अतीत अलिप्त अवघियां वेगळा । नाहीं हा गोपाळा अभिमान ॥4॥ अभिमान नाहीं तुका ह्मणे त्यासि । नेदी आणिकांसि धरूं देव ॥5॥ 4577 धरियेलें रूप कृष्ण नाम बुंथी । परब्रह्म िक्षती उतरलें॥1॥ उत्तम हें नाम राम कृष्ण जगीं । तरावयालागीं भवनदी॥2॥ दिनानाथिब्रदें रुळती चरणी । वंदितील मुनि देव ॠषि ॥3॥ ॠषीं मुनीं भेटी दिली नारायणें । आणीक कारणें बहु केलीं ॥4॥ बहु कासावीस जाला भHांसाटीं । तुका ह्मणे आटी सोसियेली ॥5॥ 4578 सोसियेला आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥1॥ वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥2॥ नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका ह्मणे ऐसी िब्रदावळी॥3॥ 4579 िब्रदावळी ज्याचे रुळते चरणीं । पाउलें मेदिनी सुखावे त्या ॥1॥ सुखावे मेदिनी कृष्णाचिये चालीं । कुंकुमें शोभलीं होय रेखा ॥2॥ होउनि भ्रमर पाउलांचें सुख । घेती भH मुख लावूनियां ॥3॥ याचसाटीं धरियेला अवतार । सुख दिलें फार निजदासां ॥4॥ निज सुख तुका ह्मणे भHां ठावें । तींहीं च जाणावें भोगूं त्यासि ॥5॥ 4580 भोगिला गोपिकां यादवां सकळां । गौळणीगोपाळां गाइऩवत्सां ॥1॥ गाती धणीवरी केला अंगसंग । पाहिला श्रीरंग डोळेभरि ॥2॥ भिH नवविधा तयांसि घडली । अवघीं च केली कृष्णरूप ॥3॥ रूप दाखविलें होतां भिन्न भाव । भH आणि देव भिन्न नाहीं ॥4॥ नाहीं राहों दिलें जातां निजधामा । तुका ह्मणे आह्मांसहित गेला ॥5॥ 4581 गेला कोठें होता कोठुनियां आला । सहज व्यापला आहे नाहीं ॥1॥ आहे साच भावें सकळव्यापक । नाहीं अभाविक लोकां कोठें ॥2॥ कोठे नाहीं ऐसा नाहीं रिता ठाव । अनुभवी देव स्वयें जालें ॥3॥ जातों येतों आह्मी देवाचे सांगांतें । तुका ह्मणे गात देवनाम ॥4॥ 4582 मना वाटे तैसीं बोलिलों वचनें । केली धिटपणें सलगी देवा ॥1॥ वाणी नाहीं शुद्ध याति एक ठाव । भिH नेणें भाव नाहीं मनीं ॥2॥ नाहीं जालें Yाान पाहिलें अक्षर । मानी जैसें थोर थोरी नाहीं ॥3॥ नाहीं मनीं लाज धरिली आशंका । नाहीं भ्यालों लोकां चतुरांसि ॥4॥ चतुरांच्या राया मी तुझें अंकित । जालों शरणागत देवदेवा ॥5॥ देवा आतां करीं सरतीं हीं वचनें । तुझ्या कृपादानें बोलिलों तीं ॥6॥ तुझें देणें तुझ्या समर्पूनि पायीं । जालों उतरायी पांडुरंगा ॥7॥ रंकाहुनि रंक दास मी दासांचें । सामर्थ्य हें कैचें बोलावया ॥8॥ बोलावया पुरे वाचा माझी कायी। तुका ह्मणे पायीं ठाव द्यावा ॥9॥ 4583 चारी वेद ज्याची कीर्ती वाखाणिती । प्रत्यक्ष ये मूतिऩ विठोबाची ॥1॥ चहुंयुगांचें हें साधन साधिलें । अनुभवा आलें आपुलिया ॥2॥ एवढें करूनि आपण निराळा । प्रत्यक्ष डोळां दाखविलें ॥3॥ दावुनि सकळ प्रमाणाच्या युिH । जयजयकार करिती अवघे भH ॥4॥ भिH नवविधा पावली मुळची । जनादऩननामाची संख्या जाली ॥5॥ नवसें ओंव्या आदरें वाचितां । त्याच्या मनोरथा कार्यसििद्ध ॥6॥ सीमा न करवे आणीक ही सुखा। तुका ह्मणे देखा पांडुरंगा ॥7॥ [[वर्ग:Transferable to Marathi Wikisource]] 2axwsghqvzur24mmfj1nf7pdugc3y3z तुकाराम गाथा 0 1548 36899 36890 2026-09-19T19:39:30Z QueerEcofeminist 1879 + 36899 wikitext text/x-wiki [[वर्ग:गाथा]] ** [[तुकाराम गाथा/ १ ते ३००]] ** [[तुकाराम गाथा/ १२०१ ते १५००]] ** [[तुकाराम गाथा/ १५०१ ते १८००]] ** [[तुकाराम गाथा/ १८०१ ते २१००]] ** [[तुकाराम गाथा/ २१०१ ते २४००]] ** [[तुकाराम गाथा/ २४०१ ते २७००]] ** [[तुकाराम गाथा/ २७०१ ते ३०००]] ** [[तुकाराम गाथा/ ३००१ ते ३३००]] ** [[तुकाराम गाथा/ ३०१ ते ६००]] ** [[तुकाराम गाथा/ ३३०१ ते ३६००]] ** [[तुकाराम गाथा/ ३६०१ ते ३९००]] ** [[तुकाराम गाथा/ ३९०१ ते ४२००]] ** [[तुकाराम गाथा/ ४२०१ ते ४५८३]] ** [[तुकाराम गाथा/ ६०१ ते ९००]] ** [[तुकाराम गाथा/ ९०१ ते १२००]] lu25157l24np4550frzks6ptgaaai2o 36900 36899 2026-09-19T19:41:00Z QueerEcofeminist 1879 + 36900 wikitext text/x-wiki [[वर्ग:गाथा]] * [[तुकाराम गाथा/ १ ते ३००]] * [[तुकाराम गाथा/ ३०१ ते ६००]] * [[तुकाराम गाथा/ ६०१ ते ९००]] * [[तुकाराम गाथा/ ९०१ ते १२००]] * [[तुकाराम गाथा/ १२०१ ते १५००]] * [[तुकाराम गाथा/ १५०१ ते १८००]] * [[तुकाराम गाथा/ १८०१ ते २१००]] * [[तुकाराम गाथा/ २१०१ ते २४००]] * [[तुकाराम गाथा/ २४०१ ते २७००]] * [[तुकाराम गाथा/ २७०१ ते ३०००]] * [[तुकाराम गाथा/ ३००१ ते ३३००]] * [[तुकाराम गाथा/ ३३०१ ते ३६००]] * [[तुकाराम गाथा/ ३६०१ ते ३९००]] * [[तुकाराम गाथा/ ३९०१ ते ४२००]] * [[तुकाराम गाथा/ ४२०१ ते ४५८३]] rkp0sqdrayzv754x7i190uxz3rxtgqs मिडियाविकी:Gadgets-definition 8 3199 36916 14531 2026-09-20T09:30:53Z NguoiDungKhongDinhDanh 2956 Remove deprecated option. See [[:phab:T298199|T298199]] for more information. ([[:m:GS|global sysop]] action) 36916 wikitext text/x-wiki == browse-gadgets == * wikidialog[hidden|default|dependencies=mediawiki.util]|wikidialog.js * CommentsInLocalTime|CommentsInLocalTime.js * sidebartranslate|langcode2name.js|sidebartranslate.js * SpecialSearch|SpecialSearch.js * rightsfilter|rightsfilter.js * contribsrange|contribsrange.js * background-awesomeness|background-awesomeness.css * subject-pages|subjects.css|subjects.js * navpop|navpop.js|navpop.css * commons-file[default|dependencies=mediawiki.util]|commons-file.js * UTCLiveClock|UTCLiveClock.js * GetCollection[dependencies=mediawiki.util]|collectionparser.js * Subpages[dependecies=mediawiki.api,@wikimedia/codex]|Subpages.js == edit-gadgets == * wiked|wiked.js * DeluxeBar[dependencies=ext.gadget.mediawiki.toolbar|rights=edit]|DeluxeBar.js * searchbox|lib-beau.js|searchbox.js * BookCat|BookCat.js * HotCat|HotCat.js * OneClickWelcomer[dependencies=site,mediawiki.util]|OneClickWelcomer.js == tab-gadgets == * purge[dependencies=mediawiki.util]|purge.js * bottomtabs|bottomtabs.css|bottomtabs.js * sixtabs[skins=monobook|dependencies=mediawiki.util]|sixtabs.js == admin-gadgets == * modrollback[rights=rollback]|modrollback.js * subpages[rights=delete|dependencies=mediawiki.util]|subpages.js * Massblock[rights=block|dependencies=mediawiki.util,mediawiki.api]|Massblock.js * CleanDeleteReasons[rights=delete]|CleanDeleteReasons.js * markblocked[dependencies=mediawiki.util]|markblocked.js * mediawiki.toolbar[hidden]|mediawiki.toolbar.js * markAdmins[dependencies=mediawiki.util,mediawiki.api]|markAdmins.js <!-- == broken-gadgets == * Twinklerevert[dependencies=mediawiki.util,jquery.ui]|twinkle.js|twinkle.css|twinklefluff.js * twinklespeedy[dependencies=mediawiki.util,jquery.ui]|twinkle.js|twinkle.css|twinklespeedy.js * twinklewarn[dependencies=mediawiki.util,jquery.ui]|twinkle.js|twinkle.css|twinklewarn.js * Twinkleunlink[dependencies=mediawiki.util,jquery.ui]|twinkle.js|twinkle.css|twinkleunlink.js * toolboxcompat|toolboxcompat.js * edittop[dependencies=mediawiki.util]|edittop.js * Special_characters|Special_characters.js * colorcats|category-colorcode.css * wkBookCreator|wknightcore.js|wkcategorize.js|wkeditinsert.js|wkdesigner.js| * autodel [dependencies=mediawiki.cookie,mediawiki.util,mediawiki.user,user,jquery.ui|rights=delete]|autodel.js * twinkledelimages[rights=delete]|twinkle.js|twinkle.css|twinkledelimages.js * extlinks[dependencies=mediawiki.util]|extlinks.js --> dffq7kopeyunzxej2u4es2aacrfupry