विकिबुक्स mrwikibooks https://mr.wikibooks.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.23 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिबुक्स विकिबुक्स चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk श्यामची आई/प्रारंभ 0 5257 36919 36131 2026-10-09T11:19:22Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36919 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई - प्रारंभ | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | मागील = = [[श्यामची आई]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र पहिली|रात्र पहिली]] | वर्ष = १९३६ | विभाग = | टिपण =}} पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे-वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्यावाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या खांद्यावर खेळत असतानाच, पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे, असा मी करीत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील, की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत; रानावनांतील कानाकोप-यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल, की, ज्याचा पत्ता कोणाला लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील, की ज्याची जगास वार्ता नाही. पृथ्वीच्या पोटात ता-यांसारखे तेजस्वी हिरे असतील; परंतु मानवजातीस त्यांचे अद्यापि दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील, की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे, असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे. हळूहळू उन्नत होत आहे, ही ज्याला जाणीव आहे, तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करितात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा नकळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. मनुष्य जन्मतो त्याच्यापूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला. त्याच्यापूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळविल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वांतून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात, असे नाही; आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव-निर्जीव सृष्टी शिकवीत असते; परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे, हे आईबापच शिकवितात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिक. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला; आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला; जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सान्निध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो; आईजवळ रडतो; आईजवळ खातोपितो; आईजवळ खेळतो-खिदळतो, झोपतो, झोपी जातो, आईजवळ त्याची ऊठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षणदात्री आईच होय. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात, ते दृढतम असतात. लहानपणी मुलाचे मन रिकामे असते. भिका-याला, चार दिवसांच्या उपाश्याला, ज्याप्रमाणे मिळेल तो बरावाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याप्रमाणेच बालकाचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल, त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान दोनचार महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले, तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो, की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात.- याचा अर्थ एवढाच, की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईने तेलकट खाल्ले, तर मुलाला खोकला होईल, आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला, तर मुलाला थंडी होईल, त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडणतंडण केले, तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणेसवरणे, मुलाच्या आसमंतात होणा-या आईच्या सर्व क्रीया, म्हणजे मुलाच्या मनाचे, बुध्दीचे, हृदयाचे दूध होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील, तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव-निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो; त्यांच्या किरणांनी कमळे फुलतात, ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो; त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळया फुलत असतात, हे खरे. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे मनुष्याचे व्यवहार, आई-बापांची कृत्ये, स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील, तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशी फुलतील; नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिक्कट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडविणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झ-याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणा-यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठऋषी वेदामध्ये वरूणदेवाला म्हणतात, "हे वरूणदेवा ! माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल, तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळीस जबाबदार धर.' '''"अस्ति ज्याजान् कनीयस उपारे"''' कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजा-यांनी, गुरूजींनी-सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळयांसमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधी कधी चार अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत; परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील इतर सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरेवाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधी कधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्या वेळी स्वत:च्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. 'श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस; पण स्वत:चे मात्र का, रे, काहीच सांगत नाहीस ?' असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, 'माझ्या स्वत:च्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते, कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईट आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत, म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष व निर्मळ व्हावे, ही माझी तळमळ, हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न ! कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता ?' "केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ता-यापरी । हुरहुर हीच एक अंतरी । ' "परंतु आम्हांला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो, असे तुम्हीच नेहमी म्हणता.' लहान गोविंदा म्हणाला. "परंतु आपण चांगलेच आठवले व ते सांगितले, तर आपण निर्दोष आहोत, असा अहंकारही जडावयाचा.' भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, 'मनुष्याला स्वत:चे अध:पतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत, हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येवो, अशी देवाला माझी प्रार्थना असते.' नारायण जरा हसत म्हणाला, 'मी निरहंकारी आहे. याचाच एखादे वेळेस अहंकार व्हावयाचा, मी आत्मप्रौढी सांगत नाही, असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची !' श्याम म्हणाला, 'या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह आहेत. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे.' श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, 'आपण का एकमेकांस परके आहोत ? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो ? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काहीएक नाही. आपण एक. जे आहे, ते सर्वांच्या मालकीचे, तू आपली अनुभवसंपत्ती का बरे चोरून ठेवतोस ? तुझ्याजवळ वादविवाद आम्हांला करावयाचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे प्रौढी ! कसला आहे गर्व ? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती हे सारे कोठून आले ? ते सांग. आम्ही आजा-याची शुश्रूषा करतो, तूही करतोस; परंतु तू आजा-याची आई होतोस, आम्हांला का होता येत नाही ? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुस-याला आपलासा करतोस; परंतु त्याच्याजवळ चार चार तास बसून, बोलूनही त्याचे मन आम्हांला ओढून का घेता येत नाही ? सांग, ही जादू कोठून पैदा केलीस ? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला ? ही कस्तूरी कोणी ओतली ? श्याम, व-हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का ? एकदा व-हाडात एका श्रीमंत व्यापा-याचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्या वेळेस एक नेपाळी कस्तूरीविक्या तेथे कस्तूरी विकावयास आला. श्रीमंत व्यापा-याने त्या कस्तूरीविक्यास भाव विचारला. तो कस्तूरीविक्या तिरस्काराने म्हणाला, 'तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तूरी ? पुण्याला जाऊन काही खपली, तर पाहावयाचे !' त्या श्रीमंत व्यापा-यास राग आला. तो म्हणाला, 'तुझी सारी कस्तूरी मोज. त्या मातीच्या गा-यात मिसळून देतो. कस्तूरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे, उत्तरेस जाऊन सांग.' त्या व्यापा-याने सारी कस्तूरी खरेदी केली व गा-यात मिसळून दिली. व-हाडातील त्या घराच्या भिंतींना अजून कस्तूरीचा वास येतो, असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या, त्या वेळेस कोणी रे, तिथे कस्तूरी ओतली ? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध ! तुझ्या जीवनाला हा वास कोठून आला ? हा रंग कोणी दिला, सांग. श्यामच्याने आता राहवेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, 'माझ्या आईचे हे देणे. गडयांनो ! माझ्यात जे काही चांगले आहे, ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरू, आई माझी कल्पतरू, तिने मला काय काय तरी दिले ! तिने मला काय दिले नाही ? सारे काही दिले ! प्रेमळपणे बघावयास, प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. मनुष्यावर नव्हे, तर गाईगुरांवर, फुलांपाखरांवर, झाडामाडांवर, प्रेम करावयास तिनेच शिकविले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्य तो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे, हे मला तिनेच शिकविले. कोंडयाचा मांडा करून कसा खावा व दारिद्रयातही स्वत्व व सत्त्व न गमविता कसे राहावे, हे तिनेच मला शिकविले. आईने जे शिकविले, त्याचा परार्धांशही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर केंव्हा बाहेर येईल, तो येवो. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, '''"मदंतरंगी करूनी निवास सुवास देई मम जीवनास"''' तीच वास देणारी, रंग देणारी, मी खरोखर कोणी नाही. सारे तिचे, त्या थोर माउलीचे. सारी माझी आई!आई!!आई!!!' असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळयातून घळघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे ओठ, त्यांचे हात, हाताची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारेच शांत होते. ता-यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला व श्याम म्हणाला, 'गडयांनो! माझे असे काही सांगण्यासारखे नाही; परंतु माझी आई कशी होती, ते मी तुम्हाला सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करीन. आईच्या आठवतील, त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एकेक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का?' "हो, चालेल!' सारे म्हणाले. राम म्हणाला, 'देवाला मागितला एक डोळा, देवाने दिले दोन!' गोविंदा म्हणाला, 'रोजच सुधारस प्यावयास मिळणार. रोजच पावनगंगेत डुंबावयास मिळणार!' {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] ci6dxlbl7xww70e0az367ejqnsu4yr6 श्यामची आई/रात्र चवथी 0 5260 36922 36132 2026-10-09T11:19:26Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36922 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र चवथी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र तिसरी|रात्र तिसरी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र पाचवी|रात्र पाचवी]] | वर्ष = १९३६ | टिपण =}} '''पुण्यात्मा यशवंत''' "त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली. "जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता.' शिवा म्हणाला. "तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्याजवळ बैस.' असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्याजवळ बसविले. श्याम सांगू लागला: "ते पावसाळयाचे दिवस होते. कोकणातील पाऊस तो. मुसळधार पाऊस ओतत होता. जिकडे तिकडे पाण्याचे लोट खळखळाटत वहात होते. पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो. त्या वेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या. इरली फारच सुंदर व साधी असतात. आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही. दादा व मी शाळेत गेलो. आम्ही शाळेत गेलो; परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले. तो दोन दिवस नालगुदाने आजारी होता; परंतु ते दुखणे बरे झाले होते. दुसरेच दुखणे उत्पन्न झाले. पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले. पोट जास्त दुखू लागले. पोट फुगू लागले. त्याला शौचास होईना व लघ्वीसही होईना. खेडयात कोठला डॉक्टर, कोठला एनिमा! घरगुती उपाय चालले होते. आमचा गडी गोविंदा आम्हास शाळेत बोलाविण्यासाठी आला. अण्णा, दादा, अशी यशवंता आमची आठवण करीत होता. आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी! गावातील काही वैद्य आले होते. पितांबरभाई, कुशाआप्पा आले होते. माझा भाऊ गडबडा लोळत होता. पोट फुगत चालले तरी त्याला अतिशय तहान लागली होती. त्याला पाणी देत नव्हते. पाण्याच्या भांडयाकडे तो गडबडा लोळत सुटे. त्याला पुन्हा धरून ठेवीत. त्याचे वय सहा वर्षांचे असेल तेव्हा. आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती. अंगणात चण्याची डाळ वाळत घातली होती. शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली. शेळीने तोंड घालून डाळ उडविली होती. ती तो सारखी करीत होता. गोळा करुन ठेवीत होता. इतक्यात आजीने पाहिले व ती म्हणाली, 'डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटते? बराच की रे आहेस!' 'नाही ग आजी, मी नव्हतो खात; उगीच आपला माझ्यावर आळ!' रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला. घरात आई सांधे दुखण्याने त्या वेळेस आजारी होती. तिला चालता येत नसे. ती फार अशक्त झाली होती. खोलीत पडलेली असे. यशवंत आत आईजवळ गेला तो आईही त्याला रागे भरली. 'डाळ खात होतास का रे? कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून?' 'आई ! मी देवाशपथ नाही हो खाल्ली डाळ, का सारीजणं मला बोलता?' असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला. आदल्या दिवशीचा तो प्रकार; परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता. सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते. यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला? इतके का त्याच्या मनास ते लागले? यशवंत वाचणार नाही, असे वाटले. नऊच्या सुमारास तर जास्तच झाले दुखणे. 'आई! मला ठेवा!' तो क्षीण आवाजात म्हणाला. 'माझ्याजवळच आहेस बाळ तू!' आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळयांत पाणी आले होते. 'आई, माझे डोके खाली ठेव हो. तुझी मांडी दुखेल. तुझे सांधे दुखतात.' यशवंत खोल आवाजात म्हणाला. आईचे हृदय गहिवरले. 'नाही हो बाळ दुखत सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकत नाही हो, मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते, माझी मांडी नाही हो दुखत. तुलाच ही माझ्या मांडीची हाडे खुपत असतील.' आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातांत घेऊन यशवंत म्हणाला, 'आई! तू आपली माझ्याजवळ बस, म्हणजे पुरे, तू जवळ असलीस म्हणजे झाले.' यशवंताचा एकेक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडीत होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे डोळे. भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले. त्या म्लान होणा-या मुखकमलावर अश्रुसिंचन केले. 'ते पहा', प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परमभक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत 'राम राम' म्हणत आम्हांस सोडून गेला! आई नेहमी म्हणायची, 'यशवंत पुण्यात्मा होता, म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला,' लहानपणी आम्ही आकाशाकडे पहात असू व तो तारा यशवंताचा असेल, असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात, असे वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही व आईही नाही; परंतु त्या मरण-प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम, ते अमर आहे. असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती. या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची सर मला नाही; मी पामर किडा; परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शीलांस जपणा-या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लागते. 'बहुता सुकृतांची जोडी' पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर मातापितरे, थोर भावंडे मिळावयासही पुण्याई लागते; परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती.' {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] rpbq9xhuvxwhjeh6pbktl6nk4k4kw2i श्यामची आई/रात्र तेरावी 0 5262 36924 36147 2026-10-09T11:19:28Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36924 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र तेरावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र अकरावी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र चौदावी]] | वर्ष = १९३६ | टिपण =}} '''स्वाभिमान- रक्षण''' "जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, असे सांगितले आहे. इतर देशांतही उपाध्याय आहेत; इतर धर्मांतही ते आहेत. काही ठिकाणी त्यांना सरकारातूनच पगार मिळतो; आपल्याकडे समाजच ब्राह्मणाला देई.' श्यामने आरंभ केला. 'आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते. शेवंतीवाङनिश्चय जेव्हा करितात, तेव्हा उभय मंडळपात-वधूवर मंडपात-दक्षिणा वाटतात. आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात. वधूघरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात. जितकी वराकडची तितकीच वधूकडची. वराकडच्यांनी चार चार आणे दिले, तर वधूपक्षही चार चार आणे देतो. जो हात पुढे करील, त्याला दक्षिणा देण्यात येत असते. लग्नाला जेव्हा मंडळी जाते, तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळीजवळच बसलेली असली, तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते. 'अरे, आपण नाही हो हात पुढे करावयाचा' वगैरे ते मुलांना सांगतात. परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही. पैशासाठी आपण हपापलेले आहोत. फुकट मिळेल, तेवढे घ्यावे. अशी वृत्ती झाली आहे. आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत. श्रीमंतसुध्दा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील. श्रीमंतांची मुलेसुध्दा नादारीसाठी अर्ज करतील. दारिद्रयाचा व दास्याचा हा परिणाम आहे. मी लग्नाला गेलो व मुलांमध्ये जाऊन बसलो. शाळेतील बरोबरीची आम्ही मुले एकत्र बसलो होतो. एका बाजूने बसले, म्हणून खोडया करता येतात, टवाळकी करता येते. कोणाच्या टोपीवर नारळाची शेंडी ठेवा, कोणाच्या खिशात खडे टाक, कोणाला हळूच चिमटा घे, असे चालते. दक्षिणा वाटण्यात आली. काही मुलांनी हात पुढे केले. मीही माझा हात पुढे केला. सहज गोष्ट होऊन गेली. माझ्या लक्षात चूक आली नाही. लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो. मी ते दोन-आणे घेऊन घरी आलो व मोठया हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो. जणू माझ्या कमाईचे, माझ्या श्रमाचेच ते होते! भटजी बाराबारा वर्षे मंत्र शिकतात, ते विधी करितात, तर त्यांना घेऊ दे. मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा, तरच ते शोभून दिसते. आईने विचारले, 'कोठले रे पैसे?' मी म्हटले. 'शेवंतीवाड्.निश्चयाचे लग्नात मिळाले.' आई एकदम ओशाळली. तिचे तोंड म्लान झाले. आम्ही गरीब झालो होतो. आपण गरीब, म्हणून मुलाने दक्षिणा आणली का? का आपण गरीब झालो, म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला, तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे, 'वेडया! तू का हात पुढे करावयाचा? तू त्या डोंग-यांकडचा ना? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हटले नाहीत? त्यांना आमची कीव आली. जगात दुसर्‍याने आपली कीव करावी याहून करुणास्पद व दु:खप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे? आईच्या मनात असे शेकडो विचार त्या वेळी आले ती बोलेना. शून्य दृष्टीने पाहत राहिली. 'आई, घे ना ग पैसे. मी काही चोरून नाही हो आणले,' मी काकुळतीस येऊन म्हटले. आई म्हणाली, 'श्याम! आपण गरीब असलो, तरी गृहस्थ आहोत. आपण भिक्षुक नाही. भिक्षुकीचा धंदा आपला नाही. आपण दक्षिणा घ्यायची नसते, ते आपले काम नाही. आपण दुस-याला द्यावी. भटजी वेद शिकतात, धार्मिक कामे करतात, त्यांना शेतभात नसते, ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न.' मी म्हटले, 'आपल्या गावातील ते पांडूभटजी किती श्रीमंत आहेत! त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का? सावकारी करतात; शेतीभाती आहे. हे असले कसले भटजी?' आई म्हणाली, 'तो त्यांचा दोष. पूर्वी भटजींना दक्षिणा जास्त मिळाली, तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत; घरी मुले शिकावयास ठेवीत. त्या पांडवप्रतापात नाही का, की नळराजाने ब्राह्मणास खूप धन दिले. ते धन ब्राह्मणांनी वाटेतच दुसर्‍याना वाटून दिले. ऋषींच्या घरी किती तरी मुले शिकावयास राहत असत. आपण गृहस्थ. आपण दक्षिणा घेऊ नये. तू पुन्हा पुढे हात करू नकोस. रोहिदास पाणपोईचेही पाणी प्यायला नाही. गृहस्थाने जगास द्यावे. जगापासून घेऊ नये.' आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले. मित्रांनो! जगापासून जितके आम्ही घेऊ, तितके जगाचे आपण मिंधे होत असतो. आपण दीनवाणे होत असतो. दुस-यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो. दीनवाणे जगणे हे पाप आहे. ताठरपणे, उन्मत्तपणे जगणे हेही पापच. जगाचे मिंधे होणे नको. युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते. आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिंधेपणा व कमीपणा मानतात. अमेरिकेचे प्रेसिडेंट हूव्हर यांची गोष्ट सांगतात. त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले. धनाढय अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूव्हर होते; परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंडयाच्या हातांखाली काम करीत होता. एका इमारतीचे बांधकाम चालले होते. ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरून पडून मेला. हूव्हरसाहेबास वाईट वाटले; परंतु ते म्हणाले, 'माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकविण्यासाठी माझा मुलगा मेला!' स्वावलंबन हा पाश्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे. स्वावलंबनाने मान वर राहते. परावलंबनाने मान खाली होते. श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये. 'तुका म्हणे घेतो तोही नरका जातो!' आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी. कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिंधा, दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो. याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करुन घ्यावे, लाकडे फोडून घ्या, कपडे धुऊन घ्या, जमीन खणून घ्या. काहीतरी काम करून घ्या. त्यात खरोखरच त्या माणसाचा उध्दार आहे. उद्योगहीनास पोसण्यात देवाचा अपमान आहे. देवाने दिलेल्या हातापायांचा, बुध्दीचा अपमान आहे. स्वावलंबन, स्वाभिमान, श्रम ह्यांची महती आज रशियात शिकविण्यात येत आहे. नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता. रशियातील परिस्थिती, तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता. मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या (फाऊंटन पेने), चाकोलेटच्या वडया, सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या. मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला. परंतु एकही हात पुढे झाला नाही. कोणीही वस्तू घेतली नाही. तो म्हणाला, 'घ्या, मी प्रेमाने देत आहे.' ते मजूर म्हणाले, 'स्वत:च्या श्रमाने मिळवावे. दुसर्‍याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य, मिंधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा. या दुर्गुणांना यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे.' तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला. केवढी ही विचारक्रांती! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत, तेथे एकही हात पुढे झाला नाही. केवढे स्वावलंबन केवढे तेज, केवढी श्रमाची पूजा! श्रमात आत्मोध्दार आहे, फुकट घेण्यात व देण्यात पतन आहे. हे हिंदी मुलांना, तमाम हिंदी जनतेला समजेल, तो सुदिन. घरी दारी, शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे. उष्टे कोणाला घालू नये, असा धर्मनियमच झाला पाहिजे. खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होय. आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणारा, दोघे किडेच! श्रीमंतही दुस-याच्या श्रमावरच जगतो व आळशी भिकारी दुसऱ्याच्या श्रमानेच खातो. हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत. उन्हातान्हात काम करणारा मजूर, रस्ते झाडणारा झाडूवाला, मलमूत्र नेणारा भंगी, मेलेली गुरे फाडणारा ढोर, वहाणा बांधणारा चांभार हे सारे, आयतेखाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत, श्रेष्ठ आहेत. काहीतरी निर्माण करा. विचार निर्माण करा, धान्य निर्माण करा, स्वच्छता निर्माण करा. काहीतरी मंगल असे, सुंदर असे, हितकर असे, निर्माण करा; तरच जगण्याचा तुम्हांस अधिकार आहे. ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक, समाजरक्षक, समाजपोषक श्रमाची पूजा होते, ते राष्ट्र वैभवावर चढते. बाकीची भिकेस लागतात. माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला; मिंधेपणा म्हणजे मरण हे शिकविले; दुसर्‍याचे घेऊ नकोस, दुसऱ्यास दे, हे शिकविले. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] osgbiixila5z89ohyp1asc3zcofc5oh श्यामची आई/रात्र दहावी 0 5263 36925 36145 2026-10-09T11:19:29Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36925 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र दहावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = [[श्यामची आई/रात्र नववी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र अकरावी]] | वर्ष = १९३६ | टिपण =}} '''पर्णकुटी''' "मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. 'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला. 'ने रे तिलासुध्दा, तीही ऐकेल. चांगले असेल ते सा-यांनी ऐकावे. मी सुध्दा आले असते; पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर.' भाऊची आई म्हणाली. 'शेजारची भिमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ?' वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती. 'चल, तेथे मग 'मला झोप येते, चल घरी' अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र!' असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकावयास मुलेमुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत. वच्छी व तिचा भाऊ आली ती गोष्ट सुरूही झाली होती. 'शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी! या भारतवर्षात भाऊबंदकी फार! कौरवपांडवांच्या वेळेपासून आहे. ती अजून आहे. भावाभावांत जेथे प्रेम नाही, तेथे स्वतंत्रता कशी नांदेल, मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात तीस वर्षे बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही-दूध दिले, परंतु स्वत: चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भावाबहिणींची लग्ने केली, त्यांच्या हौशी पुरविल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले! घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्या वेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळची हकीकत डोळयांत पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपति-उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्या वेळेस अभ्यंकर हे प्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्सवात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री नऊदहाच्या सुमारास आईने आम्हास उठवले. माझे आईबाप त्या वेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळयांतून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मो-या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले, ज्या घरात एके काळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताच्या पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले; त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाटयाने जात होतो! कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोळच्या घरी त्या वेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता; परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली; परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होईतो आजीजवळ मिळते घेई. कारण स्वत:ची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई. तिला अपमान वाटे. नव-यासह माहेरी राहणे, त्यातून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते. ओटीवर वडील जमाखर्च लिहीत होते. आई ओटीवर गेली व म्हणाली 'माझ्याच्याने येथे अत:पर राहवत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणेपिणे म्हणजे जिवावर येते.' वडील म्हणाले, 'अगं, आपण आपलेच भात खातो ना? फक्त येथे राहातो. घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हांला काय माहीत?' आई एकदम संतापून म्हणाली, 'तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी.' माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, 'आम्हाला स्वाभिमानच नाही! आम्ही माणसेच नाही जणू! दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते, मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर. तूही वाटेल तसे बोल!' वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. 'तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काही तरी मनास लावून घ्यावयाचे; पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही.' 'मलाही का राहावे असे वाटते? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना? कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधावयाचे? कसे तरी गुरांच्या गोठयासारखे नाही ना घर बांधावयाचे? त्यात राहणे म्हणजे अपमानच तो.' वडील आईची समजूत करीत म्हणाले. 'गुरांचा गोठाही चालेल; परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाले. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही; परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादे वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठया कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार. या माझ्या हातीतील पाटल्या घ्या, या पुरल्या नाहीत तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावयाचे आहे? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळयात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला?' असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. 'तुला इतके दु:ख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लौकरच लहानसे घर बांधतो.' असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे, स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या. कच्च्या विटा. त्यात कोकणात मापे असतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारिले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठ मोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई; परंतु पुन्हा ती म्हणे, 'काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी 'ऊठ' म्हणणार नाही.' झोपडीवजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेविले. मग सामान नेले. नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, 'तात्पुरते बांधले आहे. पुढे मोठे बांधू.' परंतु आई आम्हास म्हणे, 'यांच्या हातून मोठे घर आता केव्हा, कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल; परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठभाकर अमृताप्रमाणे लागेल; परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको.' त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केंव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते; परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, 'श्याम! नवे घर तुला आवडले का?' मी म्हटले, 'हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल.' माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले? जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर! नाही, आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, 'होय, मथुरी गरीब आहे; परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊ या. मनाने श्रीमंत होऊ या.' 'होय, आपण मनाने श्रीमंत होऊ. खरंच होऊ.' मी म्हटले. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, 'आई! केवढा ग तारा होता!' आई गंभीरच होती. ती म्हणाली, 'श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लौकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत? ते वरचे मोठे, मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत? मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो तरा?' 'नाही हो आई! तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर, हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शितकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत, असे त्या हरिविजयात नाही का? तसे हे घर पाहावयास ते तारेही येती. कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस.' मी म्हटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, 'श्याम! कोणी रे तुला असे बोलावयास शिकविले? किती गोड व सुंदर बोलतोस? खरेच आपले हे साधे, सुंदर घर ता-यांनाही आवडेल, सा-यांना आवडेल!' {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] b1vpu1pxuws9966da7w3lmawk01negz श्यामची आई/रात्र पाचवी 0 5267 36926 36151 2026-10-09T11:19:30Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36926 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र पाचवी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र चवथी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र सहावी]] | वर्ष = १९३६ | टिपण =}} '''मथुरी''' श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तू पडून रहा.' "अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दु:ख हरपते, तसेच आईचे स्मरण होताच माझे. आज आईची एक सुंदर आठवण आली आहे. बसा सारे.' असे म्हणून श्यामने सुरूवात केली. 'मित्रांनो! मनुष्य गरीब असला, बाहेर दरिद्रा असला, तरी मनाने त्याने श्रीमंत असावे. जगातील पुष्कळशी दु:खे हृदयातील दारिद्रयामुळे उत्पन्न झाली आहेत. हिंदुस्थानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो; परंतु भारतीय हृदयातील थोर व अतूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले. 'आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपीण होती. कोकणात घरोघर वाहीन पुरलेले असते. घरी असते. हे भात कांडून तांदूळ करावे लागतात. हे काम करण्यास येणा-या बायकांना कांडपिणी म्हणतात. घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वंशपरंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात. जणू वतनच ते. आमच्याकडे मथुरी, गजरी, लक्ष्मी अशा दोनतीन कांडपिणी होत्या. मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता, तो लहान होता. दहाबारा वर्षांचा असेल. 'मथुरी उन्हाळयाच्या दिवसात आम्हास पिकलेली करवंदे, अळू, वगैरे आणून द्यावयाची. पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील द्राक्षेच ती. अळूसुध्दा गोड फळ आहे. त्याचा तपकिरी रंग असतो. आत जाड बिया असतात. मथुरीच्या घरीच आळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत. गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात. कधी पानफूल देऊन, कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात. कृतज्ञताबुध्दीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही. 'का ग गज-ये, आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला? ही दुसरी कोण आली?' आईने विचारले. गजरी म्हणाली, 'मथुरीला ताप आला आहे. मथुरीने या चंद्रीला पाठविले आहे.' आपणास कामावर जाता न आले तर दुस-या कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे, ही कर्तव्यबुध्दी त्या गरीब मोलकरणीतही होती. 'बराच आला आहे का ग ताप?' आईने विचारले. इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला, 'श्यामची आई! माझ्या आईला आला आहे ताप. तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला, तोवर ही चंद्री येत जाईल.' 'बरे हं.' आई म्हणाली. शिवराम काम करण्यास निघून गेला. कांडपिणीने भात मोजून घेतले. आई कांडण घालून धुणी घेऊन विहिरीवर गेली. दुपारी बाराएक वाजता आमची घरातील जेवणे झाली. शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला. 'गुरांना पाणी घातलेस का, शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का? नाही तर गुरे पायांनी तुडवितील व त्यातच बसतील; गवत घालून ठेव.' आई त्याला सांगत होती. शिवराम म्हणाला, 'सारे केले. आता मी जातो.' 'थांब शिवराम. इकडे ये जरा.' आई घरात गेली व केळीच्या पानावर कढत भात व लिंबाच्या लोणच्याची फोड असे घेऊन आली. एका लहानशा गंजात तिने ताक आणिले. 'शिवराम हे तुझ्या आईला हो. म्हणावं लौकर बरी हो.' असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली. शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रूमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला. तिन्हीसांजा झाल्या. आमची शाळा सुटली होती. परवचा म्हणत होतो आम्ही. 'गज-ये! ती समई कोंडयाला पुसून नीट लख्ख करून ठेव.' आईने सांगितले. आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे. कांडणाच्या दिवशी समई पुसावयाची असा रिवाज असे. भाताच्या कोंडयाला पुसल्याने समई स्वच्छ होते. गजरी समई पुसू लागली. आई कांडण मोजून घेऊ लागली. कांडपिणीस कण्या, धापट वगैरे देण्यात आले. धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो. कांडपिणी निघून गेल्या. शिवरामाने झाडांना पाणी घातले, गुरांची दुधे काढली. आईने गाईचे दूध काढले. शिवराम घरी जावयास निघाला. सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते. तुळशीत आले पुरले होते. त्यातील आले उकरून काढले. आई शिवरामला म्हणाली, 'शिवराम, हा गवती चहा घेऊन जा. हा आल्याचा तुकडा घे. घरी काढा करा; त्यात चार धने व पिंपळाचे पान टाका व कढत कढत आईला द्या. मग पांघरूण घाला, म्हणजे घाम येईल व मोकळी होईल. थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते.' असे म्हणून आई घरात गेली व खडीसाखर घेऊन आली. शिवराम सारे घेऊन निघाला. मथुरेने शिवरामाला विचारले, 'शिवराम! हे कोणी दिले?' शिवराम म्हणाला, 'श्यामच्या आईने.' मथुरी म्हणाली, 'देवमाणूस आहे माउली. सा-यांची काळजी आहे तिला.' मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला, तरी तिला घाम आला नाही. तिचा ताप निघाला नाही. सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला. 'शिवराम! तुझ्या आईचे कसे आहे?' आईने विचारले. 'कपाळ लई दुखते, सारखे ठणकते; अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे. रात्री झोपबी नाही.' त्याने सांगितले. 'बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबरशिंग देईन, ते उगाळून तिच्या कपाळास चांगला लेप द्या, म्हणजे बरे वाटेल.' आई म्हणाली. तो जो आपल्या कामात दंग झाला. शिवराम गोठा झाडू लागला. शेणाच्या गोव-या घालू लागला. आई भाजी वगैरे चिरू लागली. दोन प्रहर झाले. शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्याएवढा भात, लोणच्याची फोड घेऊन निघाला. सुंठ व सांबरशिंग आईने त्याच्याजवळ दिले. सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात. सुंठ, वेखंड, सांबरशिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे राहते. इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात. काही दिवसांनी मथुरी बरी झाली. ती फारच खंगली होती. अशक्त झाली होती; परंतु ती कामावर येऊ लागली. पंधरावीस दिवस ती कामावर आली नव्हती. ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली, 'मथु-ये! किती ग वाळलीस तू ! कांडण होईल का तुझ्याकडून?' मथुरी म्हणाली, 'बसत उठत करू कांडण. इतके दिवस अंथरूणावर पडून खाल्ले, पुरे आता; हिंडती फिरती आता झाली आहे. चार दिवसांनी होईन धडधाकट ! तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे आम्हाला ?' आई म्हणाली, 'अग सारी देवाची कृपा. आम्ही किती एकमेकांना पुरणार! बरे पण, मुलांचा भात झाला आहे. तूही चार घास खा त्यांच्याबरोबर, म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल. दुपारी आज येथेच जेव पोटभर, ऐकलेस ना?' त्या दिवशी आमच्याबरोबर मथुरीही सकाळचे जेवली. मथुरीच्या तोंडावर त्या वेळेस केवढी कृतज्ञता होती! ती मथुरी आता म्हातारी झाली आहे. मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो. तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत. तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते. मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते, 'अरे हे काय श्याम!' तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते, 'श्याम! तुझी आई असती तर तुला असा सडाफटिंग न राहू देती. तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं. मेली बिचारी लौकर. सा-यांवर तिचा लोभ.' अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] d522qtbsf3pddveaxrt31uq05u77ojd श्यामची आई/रात्र सहावी 0 5269 36930 36168 2026-10-09T11:19:31Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36930 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र सहावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र पाचवी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र सातवी]] | वर्ष = १९३६ | टिपण =}} '''थोर अश्रू''' लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली. 'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू. खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे. आई मला पाणी तापवून ठेवीत असे. आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग चोळून वगैरे देई. दोन्ही वेळा स्नान करण्याची पध्दत फार चांगली. रात्री निजण्याचे आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ, निर्मळ व हलके वाटते. निजावयाच्या आधी आपण प्रार्थना म्हणतो, हे मनाचे स्नान, शरीर व मन स्वच्छ असली म्हणजे झोप कशी गाढ येते. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो. सदरा काढला, शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो. आंघोळीची एक मोठी धोंड होती. आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलास जात होते. संध्याकाळची आंघोळ; तिला फारसे पाणी लागत नसे. आईने खसखसा अंग चोळून दिले. उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो. पाणी संपले व मी हाका मारू लागलो. 'आई! अंग पूस माझे; पाणी सारे संपले. थंडी लागते मला. लवकर अंग पूस.' मी ओरडू लागलो. माझ्या लहानपणी टॉवेल, पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते. वडील पुरुषमंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत. एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे. संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी. आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली, 'देवाची फुले काढ.' मी म्हटले, 'माझे तळवे ओले आहेत; त्यांना माती लागेल. माझे खालचे तळवे पूस.' 'तळवे रे ओले असले म्हणून काय झाले? कशाने पुसू ते?' आई म्हणाली. 'तुझे ओचे धोंडीवर पसर, त्यावर मी पाय ठेवीन. पाय टिपून घेईन व मग उडी मारीन. मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली. पसर तुझा ओचा.' मी घट्ट धरून म्हटले. हट्टी आहेस हो श्याम अगदी. एकेक खूळ कुठून शिकून येतोस कोणास ठाऊक! हं ठेवा पाय.' आईने आपले ओचे धोंडीवर पसरले. मी माझे पाय त्यावर ठेविले, नीट टिपून घेतले व उडी मारली. आईचे लुगडे ओले झाले, त्याची मला पर्वा नव्हती. तिला थोडेच ते त्या वेळेस बदलता येणार होते? परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये, त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. ती मुलासाठी काय करणार नाही, काय सोसणार नाही, काय देणार नाही? मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो. आई निरांजन घेऊन आली व म्हणाली, 'श्याम! पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस! तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग शुध्द बुध्दी दे म्हणून.' गडयांनो ! किती गोड शब्द! आपली शरीरे व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो, किती काळजी घेतो. कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत. बूट स्वच्छ रहावे म्हणून बूटपुश्ये आहेत, अंगाला लावायला चंदनी साबण आहेत. शरीरास व कपडयास मळ लागू नये म्हणून सा-यांचे प्रयत्न आहेत; परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो? देवळाला रंग देतो; परंतु देवाची वास्तपुस्तही घेत नाही. मन मळले तर रडतो का कधी? आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळा. ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत. कपडा नाही, अन्न नाही, परीक्षा नापास झाली, कोणी मेले, तर येऊन सारे रडतात. या इतर सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळयाजवळ भरलेले आहेत; परंतु मी अजून शुध्द, निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का? अजून माझे मन घाणीत बरबटलेले आहे, असे मनात येऊन कितीकांस वाईट वाटते? मीराबाईने म्हटले आहे. 'असुवन जल सींच प्रेमवेलि बोई ।' अश्रूंचे पाणी घालून प्रेमाची, ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविली आहे. हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो. अश्रूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो!' {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] mftbx5jgcbx3kd9n73jwv7zcjymma3b श्यामची आई/रात्र चौदावी 0 5271 36923 36141 2026-10-09T11:19:27Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36923 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र चौदावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र तेरावी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र पंधरावी]] | वर्ष = १९३६ | टिपण =}} श्रीखंडाच्या वड्या आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने जात असे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे हा तर तिचा मोठा आनंद. पार्वतीबाईंची मुलगी वेणू माहेरी आली होती. पार्वतीबाई व आई यांची मैत्री होती. वेणू पुष्कळदा आमच्याकडे येत असे व आई तिला गाणी म्हणावयास लावी. एक दिवस आई मला रागे भरली होती. त्या वेळेस वेणूने माझे डोळे पुसले होते. वेणू माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणेच मला वाटे. त्या दिवशी पार्वतीबाई आईला म्हणाल्या, "श्यामची आई! वेणू परवा सासरी जाणार. तिच्याबरोबर श्रीखंडाच्या वड्या देईन म्हणत्ये. तुम्ही याल का उद्या तिसऱ्या प्रहरी? तुम्ही कशा छान करता! तिच्या सासरी पाठवावयाच्या आहेत, तर चांगल्या झाल्या म्हणजे बरे आपले." माझी आई म्हणाली, "येईन हो. वेणू परवाच का जाणार? मला वाटले होते की, राहील संक्रांतीपर्यंत. मलासुद्धा तिची करमणूक होती. यायची, गाणी म्हणून दाखवायची." पार्वतीबाई म्हणाल्या, "तिच्या सासरचे पत्र आले आहे, पाठवून द्या म्हणून. मुलगी एकदा सासरी गेली म्हणजे ती आपली थोडीच आहे! आली चार दिवस, पुष्कळ झाले. त्या कृष्णीला सासरची माणसे दोन वर्षे झाली, तरी माहेरी पाठवीत नाहीत. तिची आई त्या दिवशी रडली हो. त्यापेक्षा तर वेणूचे बरे ना? मग या हं उद्या. वेणूला तुम्हांला बोलवायला पाठवीन. जात्ये मी." आईने कुंकू लावले व पार्वतीबाई गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारची जेवणे झाली, परंतु आईला बरे वाटत नव्हते. उष्टी-खरकटी कशी तरी करून आई अंथरुणावर पडली. मी आईला विचारले, "आई, निजलीसशी?" "श्याम! अंग दुखते आहे. जरा चेपतोस का?" आई म्हणाली. मी आईचे अंग चेपू लागलो. आईचे अंग कढत झाले होते. तिचे कपाळ मनस्वी दुखत होते. मी मग बाहेर खेळावयास गेलो. इकडे वेणू आईला बोलवायला आली. आई निजली होती. "येता ना श्यामची आई, आई तुमची वाट पाहते आहे." वेणू गोड वाणीने म्हणाली. आई उठली. आई तिला म्हणाली, "जरा पडले, तो डोळा लागला. मी विसरल्ये नव्हत्ये. आता येणारच होत्ये. चल." आई वेणूकडे गेली व वड्या करू लागली. निरनिराळ्या गोष्टी त्यांच्या चालल्या होत्या. मी खेळून घरी आलो तो आई नाही. मी आईला शोधू लागलो. शेवटी वेणूताईकडे गेलो. मला अंगणात पाहताच, "काय, रे श्याम! आईला पाहावयास आलास वाटते? ये, तुझी आई माझ्यासाठी वड्या करिते आहे. मी उद्या सासरी जाणार आहे, श्याम." वेणू मला बोलली. मी म्हटले, "जाणार? मग माझे डोळे कोण पुसणार? आई रागावली, तर माझी बाजू कोण घेणार?" मला वेणू जाणार म्हणून वाईट वाटले. "ये श्याम! आपण केशराची पूड करू. तू ते वेलदोडे नीस व त्याचे दाणे काढ." वेणूच्या कामात मी मदत करू लागलो. वेणूने केशर खलले व मी सहाणेवर वेलदोड्याची पूड केली. "श्याम! कशाला रे आलास?" आईने मला विचारले. आईच्या बोलण्याचा सूर ओळखून मी म्हटले, "मी काही वड्यांसाठी नाही आलो. वेणूताई! मी हावरा आहे का ग? त्या दिवशी तू मला खाऊ दिलास. मी मागितला होता का?" वेणू म्हणाली, "श्याम! तू चांगला आहेस. श्यामची आई! श्यामला रागे भरत जाऊ नका." आई म्हणाली, "वेण्ये! अगं, मला का माया नाही? एखादे वेळेस रागावते. पण त्याच्या बऱ्यासाठीच. श्यामला जगाने नावे ठेवू नयेत, म्हणून मी त्याची आई एखाद्या वेळेस बोलते त्याला. तो चांगला आहे. परंतु आणखी चांगला व्हावा, असे मला वाटते. पार्वतीबाई, पाक झाला हो. पाहा, गोळी झाली." ताटात वड्या थापण्यात आल्या. आई केळीच्या पानाने भराभर थापीत होती. पाच मिनिटे गेल्यावर आईने वड्या पाडल्या व ती म्हणाली, "पार्वतीबाई, थोड्या वेळाने वड्या काढून घ्या, मी आता जाते." वेणू म्हणाली, "थांबा ना थोडा वेळ. तुमच्या हाताने सारे करून जा." आईला नाही म्हणवेना. थोड्या वेळाने आईने कलथ्याने वड्या काढल्या. कशा सुंदर झाल्या होत्या! पार्वतीकाकूंनी त्या डब्यात भरल्या. वेणूने एक वडी देवाला ठेवली व एक मला दिली. वेणूची आई म्हणाली, "श्याम, हे ताट खरवडून खा. घे." मी वीराप्रमाणे पुढे सरसावलो व ताट खरवडून खाल्ले. पार्वतीबाईंनी आईच्या हातात चार वड्या ठेविल्या व आई कुंकू लावून घरी गेली. मी वेणूकडेच बसलो होतो. "श्याम! तुझे सद्र्याचे बटण तुटले आहे वाटते. सदरा काढून दे म्हणजे नीट लावून देत्ये." वेणू म्हणाली. मी वेणूताईला सदरा काढून दिला. तिने फणेरे काढले. बायका सुईदोरा वगैरे ज्या चंचीसारख्या पिशवीत ठेवतात, त्याला कोकणात फणेरे म्हणतात. वेणूताईने गुंडी लावली व दुसऱ्या ठिकाणी फाटले होते, तेथेही शिवले. मी सदरा अंगात घातला. वेणूताई म्हणाली, "श्याम! चल, गुलबाक्षीची फुले तोडू व तुझ्या आईकडे घेऊन जाऊ." आम्ही फुले तोडली व आमच्या घरी घेऊन आलो. माझ्याबरोबर वेणूही आली होती. "श्यामची आई!" वेणूने हाक मारली. परंतु आई कोठे होती? ती विहिरीवर गेली होती, का गोठ्यात होती? ती अंथरुणावर होती. आम्ही एकदम आईजवळ आलो. वेणू म्हणाली, "निजल्यातशा? बरे नाही वाटत का? चुलीजवळ बसून त्रास झाला का?" वेणूने आईच्या कपाळाला हात लावून पाहिले तो चटका बसला. "श्यामची आई! बराच आला आहे हो ताप!" ती खिन्नपणे म्हणाली. मी म्हटले, "वेणूताई! आईला दुपारपासूनच बरे वाटत नव्हते. ती दुपारी निजली होती व मी तिचे अंग चेपीत होतो." वेणूने विचारले, "मी तुम्हांस बोलावण्यास आले होते तेव्हा तुम्हांला बरे नव्हते वाटत का? म्हणून का तुम्ही पडला होतात? मला काय माहीत? तुम्ही बोललासुद्धा नाही. श्यामची आई! अंगात ताप असताना का तुम्ही आलात व चुलीजवळ बसलात?" आई म्हणाली, "वेणू! अगं, त्या वेळेस काही फार ताप नव्हता हो. अंग जरा कणकण करीत होते एवढेच. श्याम! जा, बाळ, दिवा लाव, तिन्हीसांजा झाल्या." मी दिवा लावला व देवातुळशीला दाखविला आणि आईजवळ येऊन बसलो. वेणूला वाईट वाटत होते. ती गहिवरून म्हणाली, "श्यामची आई! तुम्ही अंगात ताप असता वड्या करावयास आलात म्हणून हा ताप वाढला. नसत्या वड्या झाल्या तर नसत्या. आईने कशा तरी केल्या असत्या. प्राणापेक्षा का वड्या जास्त आहेत?" माझी आई प्रेमळपणे वेणूला म्हणाली, "अगं, अशा एवढ्याशा तापाने काय होते? वेणू, आम्हां बायकांना त्याचे काही वाटत नाही. अंगात ताप फणफणत असावा, कपाळ दुखत असावे, तरी धुण्याची मोट घेऊन ती आम्ही धुऊन आणतो. दहा माणसांचा स्वयंपाक करितो. असे मनाला लावून नको घेऊ. अमळशाने जरा घाम येईल व मी मोकळी होईन. जा आता तू घरी. आई तुझी वाट पाहत असेल." वेणू आईजवळ बसली. ती जाईना. मी वेणूस म्हटले, "वेणूताई! त्या फुलांची माळ करतेस? आईला ताप आला आहे. तूच कर." वेणूताईने माळ केली. वेणू आईला म्हणाली, "श्यामची आई! माझ्यासाठी हा तुम्हांला त्रास. हा ताप." आई म्हणाली, "वेण्ये, वेड्यासारखे काय बोलतेस? तू मला परकी का आहेस? जशी माझी चंद्रा, तशीच तू. वड्या चांगल्या नसत्या झाल्या तर तुझ्या सासरच्या माणसांनी नावे ठेविली असती, तर तुला किती वाईट वाटले असते? माहेरच्या माणसांस नावे ठेविलेली ऐकून तुझ्या डोळ्यांना पाणी आले असते. वेणूच्या सासरच्यांनी तिच्या माहेरच्यांना नावे ठेवू नयेत, म्हणून मी आल्ये. पार्वतीबाई व मी दोघी मैत्रिणी. त्यांच्या मुलीसाठी थोडी कळ सोसली, म्हणून काय झाले? तुला श्याम परका वाटत नाही, तशीच मला तू वाटत नाहीस. मला त्रास का झाला? केवढे समाधान वाटते आहे मला! वड्या करायला आल्ये नसते, तर मनाला सारखी रुखरुख लागली असती. जा हो आता घरी. मी सकाळी येईन. रात्री घाम येऊन ताप निघेल. सकाळी मोकळी होईन." वेणूने मला जवळ घेतले व ती म्हणाली, "श्याम! चल तू आमच्याकडे. आईने भाजून चवळ्या केल्या आहेत त्या पडघुलीभर तुझ्याजवळ देत्ये. मग तुझ्या आईने नुसता भात केला, म्हणजे झाले. नाही तर मी भात ठेवूनच जाते." माझी आई म्हणाली, "वेण्ये! अग श्याम ठेवील भात, तू तोंडी लावणे पाठवून दे म्हणजे झाले." परंतु वेणूने ऐकले नाही. तिने विस्तव पेटविला, तांदूळ घेऊन ओवरा धुतला व आधण येताच भात ठेवून निघाली. तिच्याबरोबर मीही गेलो. मी शिजलेल्या चवळ्या घेऊन आलो व एकदम आईला जाऊन मिठी मारली. माझे डोळे भरून आले होते. आई म्हणाली, "श्याम! काय झाले?" मी म्हटले, "वेणू म्हणाली, 'श्याम! तुझी आई फार थोर आहे. तू तिचे ऐकत जा. तुझे भाग्य मोठे, म्हणून अशी आई तुला मिळाली." असे म्हणून तिने माझ्या पाठीवरून हात फिरविला व मला एकदम रडू आले ते मला अजून आवरत नाही." "जा बाळ! भात झाला असेल, तर उतरून ठेव; नाही तर खालून ओढेल." आईने हळूच सांगितले व मी भात उतरून ठेवला. दुसऱ्या दिवशी वेणूताई सासरी गेली. आम्हां सर्वांना वाईट वाटले. त्या श्रीखंडाच्या वड्या मला अद्याप आठवतात. वेणूची आई व माझी आई दोघी निघून गेल्या. वेणूसुद्धा जगली नाही; परंतु ते प्रेम अजून आहे. ते प्रेम अमर आहे. माणसे मरतात; परंतु त्यांचे सद्गुण सदैव चमकत राहतात. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] 211aq0pcherfwsoxgivdf4c3wk9rand श्यामची आई/रात्र पंचविसावी 0 5282 36927 36738 2026-10-09T11:19:30Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36927 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र पंचविसावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र चोवीसावी|रात्र चोवीसावी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र सव्विसावी|रात्र सव्विसावी]] | वर्ष = १९३६ | टिपण = }} '''रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय''' <poem> संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला विचारले. "आई! मी जाऊ का बाहेर? कमळ्या देवधराकडे, नाही तर बन्या वरवडेकराकडे जाईन. गोंधळेकरांचा बापू येथे आला, तर त्याला बहुधा मी बन्याकडे आहे, असे सांग. जाऊ का?" आई म्हणाली, "श्याम! तू जा. परंतु तुला एक काम सांगत्ये, ते आधी कर. बाळदादांच्या कवाडीपुढे एक म्हारीण बसली आहे. म्हातारी आहे अगदी. तिच्या डोक्यावरचा गोयला खाली पडला आहे. तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे. ती म्हारीण आजारी व अशक्त दिसत आहे. तिच्या डोक्यावर मोळी दे व घरी ये; मी तुला आंघोळ घालीन, जा." "आई! लोकांनी बघितले, तर मला हसतील. मला मारायला येतील; काव काव करून नुसते खायला येतील मला. खरेच जाऊ?" असे मी विचारले. "लोकांना सांग 'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. ती म्हातारी येथे किती वेळ कोणी महार येतो का, म्हणून वाट पाहत बसणार? मोळी विकून तिला परत दूर महारवाड्यात जायचे आहे' वगैरे सांग व घरी ये." असे आई म्हणाली. आईचे म्हणणे ऐकावयाचे, एवढे मला ठाऊक. मी गेलो, मी जणू रस्त्यानेच जात आहे, असे म्हातारीला दाखविले. मी मुद्दाम तिच्यासाठी आलो आहे, असे तिला वाटू नये, म्हणून मी जपत होतो. मी तिला विचारले, "का, ग, डोक्यावर का द्यायला हवी आहे मोळी? मी देतो." असे म्हणून मी एकीकडून मोळी उचलू लागलो. "नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं, तर मारतील मला! नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर." असे ती गयावया करून विनवू लागली. "अग, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे" असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली. "अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय? एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालास, वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे." श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि "श्याम! अगदीच च्येवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी!" असे ते बोलू लागले. मी त्यांना म्हटले, "मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणर नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. 'स्नानात् शुद्धीः' हे मला माहीत आहे." असे म्हणून मी तेथून गेलो. मी घरी आलो. आई म्हणाली, "त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार. कोठे लांब जाईल गोयला घेऊन? पुन्हा पडायचा एखादा. आपल्याकडची फाटीही सरली आहेत. जा, हाक मार तिला." "ए गोयलेवाली! अग, इकडे ये." मी तिला हाक मारली. आमच्या कवाडातून ती आत आली. आईने तिला किती निठवी भात घालण्याचे ते ठरविले. मी कणगीतून भात काढून आणले व तिच्या पदरात घातले. आईने तिला विचारले, "म्हाताऱ्ये, आजारी का गं आहेस?" "व्हय, माय. ताप लई येतो. काय करतांव, पोटाला हवं ना!" असे ती म्हणाली. "दुपारचा भात उरलेला आहे. शिळा झाला आहे. देऊ का तुला?" आईने विचारले. "द्या, आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कुणी नाही, बघा!" दीनवाणी म्हातारी बोलली. आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला. "वायच पाणी घालताव, दादा?" ती मला म्हणाली. पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाण पिऊन दुवा देत ती निघून गेली. "चल, श्याम, तू आंघोळ कर." आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसऱ्या दगडावर बसलो. मग स्वतःच्या हाताने पाणी घेऊन मी आंघोळ केली. आंघोळ करून मी घरात गेलो. मी आईला म्हटले, "आई, मागे ती खेरांकडे जेवणावळ झाली ना, त्या दिवशी की नाही एक गरीब म्हारीण मांडवाच्या दाराशी भीक मागत होती हो. आम्ही मांडवात जेवत होतो. पुरण[[पोळी]] खात होतो, आग्रह होत होता; भास्करभटजींना इतका आग्रह झाला, की ते रागावून उठावयास लागले. परंतु आपट्यांनी त्यांना बसविले. परंतु बाहेरच्या त्या महारणीला कोणी काही घातले नाही. ती उन्हात तळमळत होती. पंक्तीत पंख्यावर पाणी घालून वारा घालीत होते. वाळ्याचे पाणी वाढीत होते; परंतु ती गरीब भिकारीण ओरडत होती. "घास घाला हो, दादा." आई! तिला घासभर अन्न, पोटभर पाणी कोणी दिले नाही. एवढेच नव्हे, तर एक गृहस्थ मला त्यांचे नाव नाही माहीत-ते मुंबईला नोकरीस असतात व पीतांबर नेसलेले होते. ते वाढीत होते-ते एकदम मांडवाबाहेर गेले व त्या म्हारणीच्या अंगावर ओरडून म्हणाले, "लाज नाही वाटत भीक मागायला या वेळी! अजून जेवणेही झाली नाहीत. जेवणे झाल्यावर ये उष्टे मागायला. आत ब्राम्हण जेवतात, तर येथे ओरडत बसली! तुम्ही अलीकडे माजलीत म्हारडी! नीघ, का मारू वहाण फेकून!" असे म्हणून आई, त्या पीतांबरधारी मनुष्याने खरेच वहाण उचलली. "नको, रे दादा. नको रे मारु, जात्ये, रे दादा." असे म्हणून ती निघून गेली. आई, हे मुंबईला इराण्याच्या हॉटेलात खातात. दुसऱ्याचे जोडे पुसतात. यांची ह्या आपल्या गावात ऐट व मिजास! मघाची ती म्हारीण नाही का म्हणाली, "गरिबाला कोणी नाही," तेच खरे. आई! उद्या जर एखादा महाराचा मुलगा मामलेदार होऊन आला, तर त्याला हे सोवळे लोक आपल्या घरी मेजवानी देतील. त्याला पानसुपारी, अत्तर, गुलाब करतील; त्याच्या गळ्यात हार घालतील. आई! पैसा व सत्ता यांना नमस्कार करणे हाच का ग यांचा धर्म? हाच का, ग, ह्यांचा देव? हातात वहाण घेऊन त्याचा पीतांबर बाटला नाही. पायांत पायतणे घालून ही सोवळी, हे मुकटे, कद हातात घेऊन खुशाल जातात; परंतु ही वहाण ज्याने ह्यांना पायांत घालावयास दिली, तो मात्र घाणेरडा! त्याची सावलीही नको! आई! हे कसे, ग? हे कसले सोवळे? हा का धर्म! देवाला हे आवडेल का, ग? एक पैसा तेवढा यांचा देव आहे, नाही?" आई म्हणाली, "बाळ! जगात सारे पैशाला, सत्तेला मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना. ते गरीब होते. तेव्हा त्यांना सारे पंड्या पंड्या म्हणून हाका मारीत; परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वऱ्हाड-खानदेशात फावड्यांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना 'पंढरीनाथ बाबा' म्हणू लागले. कुणाच्याशा घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, "तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात. माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता; मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही. हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हांला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत." श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगाजवळ पैसे नाहीत, म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले, तर आपण महारमांग ठरू. श्याम! महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण समाजात राहावयाचे आहे. समाजाच्या निंदेला तोंड द्यावयाचे धैर्य नाही, म्हणून ते पापी आहेत, त्यांचा स्पर्श झाला, म्हणून नव्हे. पापी तर आपण सारेच आहोत." "खरेच पापातून कोणाची सुटका झाली आहे? मी निष्पाप आहे, असे छातीला हात लावून कोणाला म्हणता येईल? उलट निढळाच्या घामाने प्रामाणिक मनाने भाकर मिळविणारे महारमांगच अधिक पुण्यवान आहेत, नाही, आई?" मी विचारले. "श्याम! आपले ते विठनाककडे शेत आहे ना, ते खरे महाराचेच आहे. मला सारे माहीत आहे. काही तरी पूर्वी अदमण गल्ला दिला होता. त्याची सवाई-दिडी करून ते शेत आपण मिळविले. अरे, आपणच देवाघरी पापी ठरू. आपणांला खाली मान घालून उभे राहावे लागेल, हो!" आई खिन्न होऊन म्हणाली. "आई! दामाजीसाठी देव विठू महार नव्हता का ग झाला? महार म्हणजे घाणेरडा, पापी असे देवाला वाटते, तर त्याने ते रूप धारण केले असते का ग?" मी विचारले. आई म्हणाली, "श्याम! देवाला सारेच आकार पवित्र वाटतात. त्याने माशाचे रूप घेतले, कासवाचे घेतले, डुकराचे घेतले, सिंहाचे घेतले. ह्यातील अर्थ हाच, की देवाला सारे आकार पवित्र आहेत. देव ब्राम्हणाच्या देहात आहे, माशाच्या आहे, महाराच्याही आहे. देव गजेंद्राच्यासाठी धावतो, घोड्यांना खाजवतो, गाई चारतो. त्याला कुब्जाही आवडते व शबरीही प्रिय वाटते. त्याला गुह कोळी आवडतो, जटायू हा पक्षी आवडतो, हनुमंत हा वानर आवडतो. श्याम! देवाला सारी प्रिय आहेत. कारण सारी त्याचीच. तू माझा, म्हणून मला आवडतोस; तशी आपण सारी देवाची, म्हणून सारी त्याला आवडतो. मला आवडेल, ते तू करतोस, त्याप्रमाणे देवाला आवडेल, ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे, परंतु, श्याम! ज्याचे आपल्या आईबापांवर, बहीणभावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगावर करील का? आधी घरातील साऱ्यांवर प्रेम करा. मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले, म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी तुला काय सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास, म्हणजे तुला कळेल." आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणी तरी "श्याम श्याम" म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो. मित्रांनो! आपण खोटे श्रेष्ठकनिष्ठपणाचे वाद पुरून टाकू या. समाजसेवा करणारा प्रत्येक जण पवित्र आहे, हे लक्षात धरू या. हे जोपर्यंत होत नाही, तो पर्यंत मी असेच म्हणणार. <poem> (पद चाल-मेरे मौलाबुला) माझ्या भारती या देव मुळी नुरला सगळा अंधार रे भारतांतरि भरला? माझ्या.. नाहि दया स्नेह तिथे देव का असे बंधुभाव तीळ न, तिथे प्रभु कसा वसे देव मंदिरी ना देव अंतरी ना देव तो अजि मेला. माझ्या.. <poem> {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] omhp4a593q9xsuz6ph7tji260vmwr8k श्यामची आई/रात्र सत्ताविसावी 0 5284 36929 36844 2026-10-09T11:19:31Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36929 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र सत्ताविसावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र सव्विसावी|रात्र सव्विसावी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र अठ्ठाविसावी|रात्र अठ्ठाविसावी]] | वर्ष = १९३६ | टिपण = }} '''रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय''' <poem> आमच्या घरात त्या वेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खर्वस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली. "श्यामला खर्वस पाठविला असता, कोणी येणारे-जाणारे असते तर!" आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, "कोणी येणारे-जाणारे कशाला? मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खर्वस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील?" "त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खर्वसाने भरलेले घेऊन जावे." आई म्हणाली. आईने सुंदर खर्वस तयार केला. खर्वसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले. शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत. मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती. कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती. कोणी खेळत होती, कोणी झाडाखाली रेलली होती, कोणी वाचीत होती, तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होती; शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी, यांसारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूस एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस; तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत. आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले "श्याम, अरे श्याम" अशी हाक मारत आली. त्यांतील एकजण मला म्हणाला, "श्याम! अरे, कुणीतरी तुला शोधीत आहे. आमचा श्याम कोठे आहे, अशी चौकशी करीत आहे." इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, "भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो." वडिलांचा तो कसातरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांत मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखांचे कळू लागले होते. सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही! मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतरदृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भल्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची, जीवनाला सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. सहा कोस वडील चालून आले. का आले? तो खर्वस, ती एक खर्वसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात! हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खर्वस दिला असता तर? एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर? शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा, असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजीत होते, म्हणून थोडेतरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्या वेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत, माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावीत होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे, ओसाड नाही, रूक्ष, भगभगीत नाही. मुले मला हसतील. "ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट!" असे म्हणून चिडवतील, ह्याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे जण 'अहं वेद' असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे 'अहं!' सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू, सारे आपलेच. आपणांस म्हणून मोठे होता येत नाही. जो स्वतःस विसरू शकत नाही, तो काय प्रेम करणार?" वडील म्हणाले, "श्याम! तुझ्या आईने तुला खर्वस पाठविला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या." त्यांनी खर्वसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, "श्याम! अरे, बघत काय बसलास? टाक उरकून! लाजायला काय झाले? या, रे मुलांनो! तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खावयाला लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी नयेच खाऊ. चारचौघांना द्यावे." इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. "ये रे श्याम! या रे आपण फन्ना करू. फडशा पाडू." असे तो म्हणाला. आम्ही सारे खर्वसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो, तर म्हणाले, "तुम्हीच खा. मुलांनीच खाण्यात गंमत आहे." आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, "झाला, रे, खाऊन? आण ते भांडे. मी नदीवर घासून घेईन." ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, "अभ्यास नीट कर, हो. प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे." असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो. मला माझी शरम वाटत होती; अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे, असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली; परंतु रुखरुख लागून राहिली. सहा कोस केवळ खर्वसाची [[वाटी]] घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई! या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीणभावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन, तर त्यानेच थोडे अनृणी होता येईल. येरव्ही नाही. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] howanhtuvs0lrw4v63yi7buuyh2q419 श्यामची आई/रात्र अडतिसावी 0 5295 36920 36136 2026-10-09T11:19:25Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36920 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र अडतिसावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र सदतिसावी|रात्र सदतिसावी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र एकोणचाळिसावी|रात्र एकोणचाळिसावी]] | वर्ष = १९३६ | टिपण = }} '''रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार''' <poem> श्याम आजारी पडला. अंगात तापही होता. डोळे मिटून तो पडला होता. "श्याम! पाय चेपू का?" गोविंदाने विचारले. "नको, माझे पाय चेपून काय होणार! माझी सेवा नको करायला. तुम्ही आपापली कामे करा. त्या मोहन पाटलाचा ताका लौकर विणून द्या. जा, माझ्याजवळ बसून काय होणार! राम राम म्हणत मी शांत पडून राहीन." श्याम म्हणाला. "श्याम! कोणी आजारी पडले, तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला, तर त्याच्याजवळ नको का बसायला?" रामाने विचारले. "अरे, इतका का मी आजारी आहे! तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो, तरी पोटभर जेवलो, असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे, असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात, काही वातबीत झाला, तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात, तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जा तू. राम, तूही पिंजायला जा!" श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले. सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरुणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता. सुचो रुचो ना तुजवीण काही जडो सदा जीव तुझ्याच पायी तुझाच लागो मज एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझाच लागो मज एक नाद सरोत सारेच वितंडवाद तुझा असो प्रेमळ एक बंध मुखात गोविंद हरे मुकुंद "काय रे? आतासे आलात?" श्यामने विचरले. "तुम्ही रात्री सांगणार का गोष्ट?" एका लहान मुलाने विचारले. "हो, सांगेन. तुम्ही या." श्याम म्हणाला. "पाहा, तुम्हांला छानछान दगड आणले आहेत. आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो." एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले. "खरेच, किती सुंदर आहेत हे! या, आपण त्यांची चित्रे करू. मी पोपट करतो हां!" असे म्हणून श्याम त्या खड्यांचा पोपट करू लागला. मुले एकेक खडा देत होती. "आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा," श्याम म्हणाला. "हा घ्या, हा पाहा चांगला आहे." एक मुलगा म्हणाला. श्यामने तो खडा लाविला व सुंदर राघू तयार झाला. "आता मोर बनवा मोर." दुसरा एक मुलगा म्हणाला. "तुम्हीच बनवा मोर." श्याम म्हणाला. "आम्हांला चांगला येत नाही." तो म्हणाला. "पण आता तुम्ही घरी जा. लौकर जेवून या." श्यामने सांगितले. "चला, रे, जेवण करून येऊ." एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली. श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला. या लहान खड्यांत किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खड्यांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती. गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले. "श्याम! काय आहे तुझ्या हातांत? फूल का?" रामने विचारले. "अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो." श्याम म्हणाला. "मग काय आहे हातांत?" नामदेवाने विचारले. "देवाच्या मूर्ती." श्याम म्हणाला. "तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला?" भिकाने विचारले. "हो, पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहेत." श्याम म्हणाला. "पाहू दे, कसली आहे?" असे म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली. त्या मुठीतून माणिक-मोत्ये बाहेर पडली. "हे माझे हिरे, हे माझे देव. लोक म्हणतात, समुद्राच्या तळाशी मोत्ये असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात. मला तर प्रत्येक नदीच्या वाळूत व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोत्ये दिसतात. पाहा रंग कसे आहेत!" असे म्हणून श्याम दाखवू लागला. "श्याम, आज बोलणार ना तू?" रामने विचारले. "हो, त्या मुलांना मी सांगितले आहे, जेवून या म्हणून. त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले. त्यांनीच हा आनंद दिला व उत्साह. मी आता दोन ताससुद्धा बोलेन. प्रार्थनेची वेळ झाली असेल ना?" श्यामने विचारले. प्रार्थनेची वेळ झाली होती. श्याम अंगावर पांघरूण घेऊन बसला होता. प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला. जप्तीच्या वेळी आमची दूर्वांची आजी घरी नव्हती. ती कोठे गावाला गेली होती, ती परत आली. आई त्या दिवसापासून अंथरुणालाच खिळली. तिच्या अंगात ताप असे, तो निघत नसे. शुश्रूषा तरी कोण करणार! आजीला होईल तेवढं आजी करीत असे. राधाताई मधून मधून येत व आईला कधी मुरावळा वगैरे आणून देत. कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात देत. जानकीवयनी, नमूमावशी वगैरे येत असत. परंतु घरात आता काम कोण करणार? शेजारच्या शरदला न्हाऊ कोण घालणार? आई जे दोन रुपये मिळवीत होती, ते आता बंद झाले. वडील आले, म्हणजे दूर्वांची आजी रागाने चरफडे, बडबडे. "मेला स्वयंपाक तरी कसा करावयाचा? चुलीत घालायला काडी नाही, गोवरीचे खांड नाही; भाजीला घालायला तेल नाही, मीठ नाही. का नुसता भाजीभात उकडून वाढू?" दूर्वांची आजी बोलत होती. माझे वडील शांतपणे तिला म्हणाले, "नुसते तांदूळ उकडून आम्हांला वाढ, द्वारकाकाकू! आमची अब्रू गेलीच आहे. ती आणखी दवडू नका." त्या दिवशी आई पुरुषोत्तमाला म्हणाली, "पुरुषोत्तम! तुझ्या मावशीला पत्र लिही. आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल. तिला लिही, म्हणजे ती येईल. राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे. जा, घेऊन ये; नाहीतर इंदूलाच मी बोलावत्ये, म्हणून सांग. तीच चांगले पत्र लिहील. जा बाळ, बोलावून आण." पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू कार्ड घेऊन आली. "यशोदाबाई! जास्त का वाटते आहे? कपाळ चेपू का मी जरा?" ती प्रेमळ मुलगी म्हणाली. "नको इंदू, विचारलेस एवढेच पुष्कळ हो. कपाळ चेपून अधिकच दुखते. तुला पत्र लिहिण्यासाठी बोलाविले आहे. माझ्या बहिणीला पत्र लिहावयाचे आहे. सखूला. तिला माझी सारी हकीकत लिही व मी बोलाविले आहे, म्हणून लिही. कसे लिहावे, ते तुलाच चांगले समजेल." आई म्हणाली. इंदूने पत्र लिहिले व वर पत्ता लिहिला. पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला. इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेली. "बाळ, पाणी दे रे!" आई माझ्या लहान भावाला म्हणाली. तो एकदम तोंडात ओतू लागला. "चमच्याने घाल रे तोंडात, संध्येच्या पळीने घाल, चमचा नसला कुठे तर." असे आईने सांगितले. आईने सांगितले, तसे पुरुषोत्तमाने पाणी पाजले. "या जानकीबाई, या हो, बसा." जानकीबाई समाचाराला आल्या होत्या. "पाय चेपू का जरा?" त्यांनी विचारले. "चेपू बिपू नका. ही हाडे, जानकीबाई, चेपल्याने खरच जास्त दुखतात. जवळ बसा म्हणजे झाले." आई म्हणाली. "आवळ्याची वडी देऊ का आणून? जिभेला थोडी चव येईल." जानकीबाईंनी विचारले. "द्या तुकडा आणून." क्षीण स्वरात आई म्हणाली. "चल पुरुषोत्तम, तुजजवळ देत्ये तुकडा, तो आईला आणून दे." असे म्हणून जानकीवयनी निघून गेल्या. पुरुषोत्तमही त्यांच्याबरोबर गेला व त्यांनी दिलेली आवळ्याची वडी घेऊन आला. आईने तोंडात लहानसा तुकडा धरून ठेवला. पुरुषोत्तम जवळ बसला होता. "जा हो बाळ, जरा बाहेर खेळबीळ, शाळेत काही जाऊ नकोस. मला बरे वाटेल, त्या दिवशी शाळेत जा. येथे कोण आहे दुसरे?" असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली. पुरुषोत्तम बाहेर खेळावयास गेला. तिसरे प्रहरी नमूमावशी आईकडे आली होती. आईची ती लहानपणची मैत्रीण. ती गावातच दिली होती. दोघी लहानपणी भातुकलीने, हंडी-बोरखड्याने खेळल्या होत्या. दोघींनी झोपाळ्यावर ओव्या म्हटल्या होत्या. दोघींनी एकत्र मंगळागौर पूजिली होती. एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या. नमू मावशीला आईकडे वरचेवर येता येत नसे. तिचे घर होते गावाच्या टोकाला. शिवाय तिलासुद्धा मधूनमधून बरे नसे. "ये नमू, कसं आहे तुझं? तुझ्या पायांना जरा सूज आली होती, आता कशी आहे?" आईने नमूला विचारले. "बरे आहे. चाफ्याच्या पानांनी शेकविले. सूज ओसरली आहे. पण, तुझं कसं आहे? अगदीच हडकलीस. ताप निघत नाही अंगातला?" नमूमावशी आईच्या अंगाला हात लावून म्हणाली. "नमू, तुझ्याबरोबर पुरुषोत्तम येईल, त्याच्या बरोबर तांबलीभर तेल दे पाठवून. तेलाचा टाक नाही घरात. द्वारकाकाकू ओरडते. तुला सारे समजते. मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले." आई म्हणाली. "बरे हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर." नमू म्हणाली. "आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहाळे तेवढे पुरेत." आई म्हणाली. "तिन्हीसांजचे असे नको ग बोलू. उद्या की नाही, तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन. खाशील ना?" नमूमावशीने विचारले. "नमू! डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजिरवाणे हे जिणे!" आई डोळ्यांत पाणी आणून म्हणाली. "हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का?" नमूने विचारले. "महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रुपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार काय? शिकवणी वगैरे करतो. परवा पाच रुपये आले हो त्याचे. पोटाला चिमटा घेऊन पाठवीत असेल." आई सांगत होती. "श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे?" नमूने विचारले. "त्याला कळवू नका, असे मी त्यांना सांगितले. तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल. उगीच कशाला त्याला काळजी? येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ? येथे आला, म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे. पैशाशिवाय का ही लांबची येणीजाणी होतात? येथे कापात जवळ होता, वाटेल तेव्हा येत असे; परंतु विद्येसाठी लांब गेला. त्याला देव सुखी ठेवो, म्हणजे झाले. माझे काय?" आई म्हणाली. नमूमावशी निघाली. "कुंकू लाव, ग. तेथे कोनाड्यात करंडा आहे." आईने सांगितले. नमूमावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लाविले व आईलाही लावले व ती निघून गेली. "आई! हे बघ मावशीचे पत्र. मला सारे लागले. वाचू मी?" असे म्हणून पुरुषोत्तमने मावशीचे पत्र वाचून दाखविले. मावशीचे अक्षर सुवाच्य व ठसठशीत असे. मावशी येणार होती. आईला आनंद झाला. इतक्यात इंदू आली. "इंदू! उद्या येणार हो सखू. तू पत्र लिहिले होतेस ना! हे बघ तिचे पत्र. दे रे इंदूताईला." आई पुरुषोत्तमास म्हणाली. इंदुताईने पत्र वाचले व ती म्हणाली, "मी पाहीन त्यांना. तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा. वाटे, की केव्हा त्यांना बघेन." इंदूच्या आईने इंदूला हाक मारली. "पुरुषोत्तम! चल आमच्याकडे. आईने सांजा केला आहे, चल." इंदू म्हणाली. "जा बाळ, त्या परक्या नाहीत, हो." असे आईने सांगितले. तेव्हा तो गेला. "माझ्यामुळे तुझे असे हे हाल. तुला नीट खायला-प्यायलाही मला देता येत नाही. मी अभागी आहे, काय करू मी तरी?" वडील आईजवळ बसून म्हणत होते. "हे काय असे? तुम्हीच जर हातपाय गाळून रडायला लागलेत, तर धाकट्या पुरुषोत्तमाने काय करावे? पुरुषांनी धीर सोडता कामा नये. तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका. तुमच्या जिवावर मी पूर्वी उड्या मारल्या. सारी सुखे भोगली. वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत चार कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही, तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहा. तुमच्या डोळ्यांत मी येऊन बसेन हो." असे आई बोलत होती. "तू सुद्धा बरी होशील. सखू येत आहे, ती तुला बरी करील." वडील म्हणाले. "कशाला खोटी आशा आता! आतून झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हातांनी मी जाईन. सुवासिनी मी जाईन. तुम्हांला कोण? म्हणून फक्त वाईट वाटते; नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दुःखेही मला आनंददायकच वाटतात." असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता. "पाणी, थोडे पाणी द्याना तुमच्या हाताने." आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले. "तुमच्या हातचे पाणी म्हणजे पावनगंगा; अमृताहून ते गोड आहे. बसा आज माझ्याजवळ. जाऊ नका कोठे. मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो." असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन, आई डोळे मिटून ध्यान करू लागली. फार थोर, गहिवर आणणारे, पावन असे ते दृश्य होते. इतक्यात राधाताई आल्या. तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या. "या. इंदूच्या आई, या." म्हणून विनयशील वडील बाहेर उठून गेले. राधाताई आईजवळ बसल्या. आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरविला. केस जरा सारखे केले. "पहाटे येणार वाटतं तुमची बहीण?" त्यांनी विचारले. "हो पत्र आले आहे. इंदूने वाचले." आई म्हणाली. "तिनेच सांगितले. बरे होईल. प्रेमाचे माणूस जवळ असले, म्हणजे बरे वाटते." राधाताई म्हणाल्या. "सारी प्रेमाचीच माणसे आहेत. ते जवळ आहेत, तुमचा शेजार आहे, आणखी काय पाहिजे?" आई म्हणाली. थोडा वेळ बसून राधाताई निघून गेल्या. मावशी पहाटे येणार होती. पुरुषोत्तम किती लवकर उठला होता. तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता. बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत. जरा कवाडीशी गाडी थांबली, असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाई व पाही. परंतु गाडी पुढे निघून जाई. शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली. "आपल्याच बेड्याशी थांबली रे!" आजी म्हणाली. दूर्वांची आजी पोतेरे घालीत होती. पुरुषोत्तम धावत गेला. वडीलही पुढे गेले. होय. मावशीच आली होती. पुरुषोत्तम करंडी घेऊन आला. वडील ट्रंक घेऊन आले. मावशी वळकटी घेऊन आली होती. भाडे घेऊन गाडीवान निघून गेला. "आई, मावशी आली ना! ही बघ, खरेच आली." आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाला, पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होते. "आली? माझी वाट मोकळी झाली!" असे आई म्हणाली. अर्धवट शुद्ध, अर्धवट जागृती होती. मावशी आईजवळ बसली. कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती! आईची दशा पाहून, तो अस्थिचर्ममय देह पाहून मावशीचे डोळे भरून आले. "अक्का!" मावशीने हाक मीरली. त्या हाकेत, त्या दोन अक्षरांत मावशीचे प्रेमळ व उदार अंतःकरण ओतलेले होते. "आलीस सखू, बस. तुझीच वाट पाहत होत्ये. म्हटले, केव्हा येतेस! पण आलीस लौकर. प्राण कंठी धरून ठेवले होते. म्हटलं, तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून, तुझ्या पदरात घालून जाईन. सखू!" आई रडू लागली. "अक्का! हे काय वेड्यासारखे. मी आल्ये आहे. आता बरी होशील हो. तुला बरे वाटू दे; मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन. आता मला नोकरी लागली आहे." मावशी म्हणाली. "नको हो आता कोठे येणे-जाणे. आता फक्त देवाकडे जाऊ दे. या मठीतच कुडी पडू दे. मी आग्रह करकरून झोपडी बांधविली. ही स्वतंत्र झोपडी बांधविली. येथेच, माझ्या राजवाड्यातच देह पडू दे. त्यांच्या मांडीवर, तू जवळ असता, मरण येऊ दे. माय मरो व मावशी जगो, असे म्हणतात, ते खरे ठरो. सखू! तुला ना मूल, ना बाळ. तुझा संसार देवाने आटपला; जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्याने निर्माण केले. माझ्या मुलांचे सारे तू कर. तूच त्यांची आई हो!" आई बोलत होती. "अक्का! हे काय असे? बोलू नकोस. बोलण्याने त्रास होतो. जरा पड. मी थोपटते हं." असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लअँकेट आईच्या अंगावर घातले. चौघडी व गोधडी याशिवाय तिला काही माहीत नव्हते. मावशी आईला खरोखरच थोपटीत बसली. गंगा व यमुना यांचे पावित्र्य तेथे होते. उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] 3eb3ttbzycikxni1mq89t8irq924nvr श्यामची आई/रात्र एकेचाळिसावी 0 5298 36921 36139 2026-10-09T11:19:25Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36921 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र एकेचाळिसावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र चाळिसावी|रात्र चाळिसावी]] | पुढील = [[श्यामची आई/रात्र बेचाळिसावी|रात्र बेचाळिसावी]] | वर्ष = १९३६ | टिपण = }} '''रात्र एकेचाळिसावी : भस्ममय मूर्ती''' <poem> आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, "का, रे, नाही भेटायला आलास? तुला त्यांनी कळविले नाही का? त्या दिवशी रागावून गेलास. अजून नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लौकर जातो; मग तुझा रे कसा नाही जात? ये, मला भेट." सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसेसेच होई. आज आई फार आजारी नसेल ना, असे मनात येई. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो, असे वाटे. परंतु किती दूर जावयाचे! दोन दिवस जावयाला लागले असते. आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास! मला वाईट वाटत होते. जिवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावे, असे वाटे. परंतु पैसे? मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचे नाव नामदेवच होते. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम व जितकी भक्ती होती, तितकेच प्रेम व भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझाच झाला होता व मी त्याचा. "यूयं वयं वयं यूयं" असे आम्ही कितीदा म्हणावयाचे! माझ्या हृदयातले सारे न बोलताही त्याला कळत असे. त्या नानकाच्या पदात आहे ना, "अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपाया" देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दुःख न बोलताही समजते. नामदेवाला माझे सुखदुःख समजे. माझा जीवनग्रंथ, हृदयग्रंथ त्याला वाचता येत असे. माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचीत असे. जणू आम्ही एकमेकांची रूपे होतो. जणू दोन कुडींत एक मन होते, एक हृदय होते. जणू मनाने व हृदयाने आम्ही जुळे होतो. "नामदेव! मला घरी जावेसे वाटत आहे. आई फार आजारी आहे, असे वाटते. सारखी हुरहुर लागली आहे." मी म्हटले. "मग जा, भेटून ये." तो म्हणाला. "आईला डोळे भरून पाहून येईन! पण पैसे?" मी म्हटले. "काल नाही का माझी मनीऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे. दहा रुपये आहेत. तुला पुरतील? आईला भेटून ये, माझा नमस्कार सांग. जा." नामदेव म्हणाला. थोडेसे सामान घेऊन मी निघालो. स्टेशनवर नामदेव पोचवावयास आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले होते. "पत्र लगेच पाठव बरे, श्याम." नामदेव म्हणाला. "होय." मी म्हटले. "तुझ्याबरोबर मी आलो असतो. पण पैसे नाहीत." तो म्हणाला. "तू माझ्याबरोबर आहेसच." मी म्हटले. गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्यांआड झाला. गाडी सुटली व डोळ्यांतून पाझर सुटले-शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रुसिंचन करीत मी जात होतो. बोरीबंदरवर उतरून तसाच परभा मी बोटीवर गेलो. कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो, तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदयही शतभावनांनी नाचत होते. रवींद्रनाथांची गीतांजली माझ्या हातात होती. "आई! माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षःस्थळावर रुळेल." हे मी वाचीत होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळही अश्रुंशिवाय द्यावयास दुसरे काही नव्हते. मध्येच मी गीतांजली मिटीत असे व समोरच्या उचंबळणाऱ्या सागराकडे बघे. या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुसऱ्या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदयसागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसऱ्या स्मृतीस जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग-दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टीत, स्मृतिसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रमून गेलो. रंगून गेलो. आईच्या स्मृतिसागरात हा श्याममत्स्य डुंबत होता, पोहत होता, नाचत होता. हर्णे बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हर्णे हर्णे खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकट्या बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडे बांधले. आणखी सात-आठ तासांनी आईचे पाय पाहीन, प्रेमाने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन, असे मनात मी म्हणत होतो. हर्णे बंदर आले. पडाव बोटीजवळ आले. त्यांत माणसे उतरली. मीही पडावात उतरलो. बंदरावरून कोणी तरी माझ्याकडे पाहात होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरून येत होते. कोणाची ती मूर्ती होती? पडाव उभा राहिला. मी पटकन् उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपझप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडले? मावशी! माझ्या दृष्टीस माझी मावशी पडली. "मावशी! तू इकडे कोठे? परत जातेस होय पुण्याला? आईचे बरे आहे वाटते?" असे मी विचारले. मावशीच्या गंगा-यमुनांनी उत्तर दिले. "मावशी! बोलत का नाहीस?" मी काकुळतीने विचारले. "श्याम! तुझी आई, माझी अक्का, देवाजवळ गेली!" ती म्हणाली. माझा शोकसागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हते. "मला बोलावलेत ग का नाही? मला स्वप्न पडले, म्हणून मी निघालो. स्वप्नात आई मला हाक मारी. परंतु आता कोठची आई? कायमची अंतरली आई!" असे म्हणून मी रडू लागलो. "श्याम! त्या दिवशी तुझीच सारखी आठवण ती काढीत होती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे, अजून हट्टीच आहे. श्याम! दोन दिवसांत अक्का जाईल, असे वाटले नव्हते. मी तुला बोलवावयाचे ठरविले; परंतु त्याच दिवशी अक्का गेली! सारे प्रयत्न केले. तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हांला. अक्काने तुम्हांला माझ्या पदरात घातले आहे. मी तुम्हांला आईची आठवण होऊ देणार नाही. उगी, किती रडशील!" मावशी मला समजावीत होती. "मावशी! माझे केवढाले मनोरथ! माझ्या आईला सुख देईन. तिला फुलासारखी ठेवीन, असे मी मनात म्हणे. परंतु आता कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला शिकू?" मी म्हणालो. "तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शीक; आमच्यासाठी शीक. जगासाठी शीक. आईला प्रेम देणार होतास, ते जगाला दे. जगातील दुःखी मातांना दे." मावशी नवीन दृष्टी देत म्हणाली. "मावशी! तू परत निघालीस?" मी विचारले. "होय. तेथे माझ्याने राहवेना. तू घरी जा. उद्या तिसरा दिवस. अस्थिसिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका; म्हणून उत्तरक्रियेला आलास. येताना अस्थी घेऊन ये. गंगेत नेऊन टाकू." मावशी म्हणाली. "मावशी! मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ?" मी म्हटले. "त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला, तरी वडिलांचा तारा आहे. तुझ्या भावाचा तारा आहे. तेथे सारा अंधार नाही. तेथे प्रेम आहे. जा घरी, त्यांना धीर दे. तू शहाणा, विचार करणारा, गीतांजली, गीता वाचणारा," मावशी म्हणाली. "श्याम! आलास का, थांब, हो, देवाला गूळ ठेवते, असे आता मावशी कोण म्हणेल?" मी म्हणालो. "श्याम! या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली, तरी प्रेमरूप आई-स्मृतिरूप आई-तुझ्याजवळ आहे. जेथे जाशील, तेथे आहे. चल, तुझ्यासाठी गाडी ठरवू." असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरविली. मावशीची बोट दूर दिसू लागली. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली. मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवनसमुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटांतून वर येत आहे, असे मला दिसे. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. कारुण्यमूर्ती माता! तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रमाणे दिसू लागली. शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्या वेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणे कोठले? तेथे हाय हाय होती! घरात एक मिणमिणा दिवा जळत होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावर बसलेले होते. "श्याम! दोन दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून, बाळ!" ते म्हणाले. पुरुषोत्तम जागा झाला. "अण्णा, अण्णा," असे म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हांला कोणासही बोलवत नव्हते. दूर्वांची आजी म्हणाली, "तुझीच आठवण काढीत होती हो श्याम! तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तरक्रियेला तरी आलास. रडू नको. आता उपाय का आहे? तुम्ही मोठे होईतो हवी होती ती जगायला. परंतु नाही त्याची इच्छा." मी ऐकत होतो. अस्थिसंचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजी बरोबर होते. नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात् करण्यात आला होता, तेथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जसाच्या तसा भस्ममय देह होता. वाऱ्याने इवली देखील मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केले. सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह तेथे होता. अत्यंत शुद्ध असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्येने आधीच देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्माइतकाच पवित्र झाला होता. मनाने तर ती पवित्र होतीच होती. लावला, मी हात लावला. भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या हृदयात अभंग मूर्ती निर्माण करून ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीने कोणाच्या हृदयात जर आपणास अनश्वर मूर्ती निर्माण करता आली तर केवढे भाग्य? मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले, ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले, स्वतःच्या पत्नीच्या गळ्यात घालण्यासाठी नेले. सर्व विधी करून आम्ही घरी गेलो. एकेक दिवस जात होता. पुरुषोत्तमाच्या तोंडून एकेक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणीचे पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम मजजवळ वाचीत असे व मी ऐकत असे. शेजारच्या इंदू, राधाताई यांनीसुद्धा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत. आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असे म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळ्यांना आमंत्रण दिले. "आला, एक कावळा आला, तो दुसराही आला," चुलते म्हणाले. आम्हांला बरे वाटले. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडाजवळ बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरट्या घालीत; परंतु स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले, मी म्हटले, "आई! तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही." तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, "आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर, वयनी, प्रेम करू." तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीस आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाला कावळा करून शिववितात; परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, "पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एवढ्यात दर्भाचा नका करू." नदीवरून जड अंतःकरणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळीशेजारी पिंड ठेविले. भोवती कावळे जमले; परंतु एकही शिवेना! शेवटी माझी दूर्वांची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, "यशोदे, काही काळजी नको करू. पुरुषोत्तमला मी आहे. त्याचे सारे मी करीन." काय चमत्कार! आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन् कावळा शिवला. माझ्या डोळ्यांत पाणी आले. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरुषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खोड्याळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई! केवढे तुझे प्रेम! तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे व समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल ह्याची कल्पना ह्या संसारातील आईवरून येईल. स्वतःच्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठीच ह्या छोट्या आईला ती जगन्माऊली पाठवीत असते. गड्यांनो! माझी आई मेली. तिचे जीवन सरले तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाहीत तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहेत, त्याच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, जोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊभाऊ सारे प्रेमाने परस्परांस मदत करतील, श्रेष्ठकनिष्ठ मानणार नाहीत, एकमेकांस वाढवतील, पाळतील, पोसतील, हसवतील, ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार! तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार!" {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] 5r3s79gl3vvhmoycin1xljmvihdjfnx श्यामची आई/रात्र बेचाळिसावी 0 5299 36928 36158 2026-10-09T11:19:30Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36928 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्यामची आई/रात्र बेचाळिसावी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[श्यामची आई/रात्र एकेचाळिसावी|रात्र एकेचाळिसावी]] | पुढील = [[श्यामची आई]] | वर्ष = १९३६ | टिपण = }} '''रात्र बेचाळिसावी : आईचे स्मृतिश्राद्ध''' <poem> "गड्यांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवावयाचा आहे. माझ्या आईवर बायामाणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोर्या गाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवावयाला बसली म्हणजे मथी जेवायला येई. मथी नेहमी आईच्या भोवती भोवती असावयाची. आई शौचास गेली, विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जावयाची. आईच्या पायांत शेपटीचे फलकारे देत नाचावयाची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला अतोनात लळा होता. आईचे आजारपण वाढत चालले, तसतशी मथीही नीट खातपीतनाशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात तिला घातला, तरी ती दोन शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला तरी त्या तिला दूध-तूप भरपूर मिळत असे. परंतु इतरांच्या दुधातुपातही तिला रस वाटत नसे. ज्या दिवशी आई गेली, त्या दिवशी ती सारखी म्यांव म्यांव करीत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला; तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्नपाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली, तेथे आम्ही दहा दिवस मृतात्म्यासाठी दूधपाणी ठेवत असू; तशी पद्धत आहे. परंतु मथी त्या दुधास शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्यांव म्यांव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशनव्रत व मौनव्रत जणू घेतले. तिसऱ्या दिवशी, ज्या जागी आईने प्राण सोडले, त्याच ठिकाणी मथीने-त्या मांजरीने-प्राण सोडले! माझ्या आईची मांजर आईपाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषमय वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचेच प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हांस लाज वाटली. मी मनात म्हटले, "आई! माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणच्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही!" "मित्रांनो! अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्यात जे चांगले आहे, जे पवित्र आहे, ते सारे तिचे आहे. माझी आई गेली; परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर भोसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली, "माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते." माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दसले असेल! हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच, या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल, असे तिला वाटले असेल. इतर बंधुभगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. स्वातंत्र्ययुद्धात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत, एकच नव्हे तर अनेक आया श्यामला मिळू देत, यासाठी माझी आई निघून गेली असेल. ह्या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझीच आई, दत्तूची आई ती माझीच आई, गोविंदाची आई ती माझीच आई, वसंतरावांची आई ती माझीच आई, कृष्णाची आई ती माझीच आई, सुभानाची आई ती माझीच आई. साऱ्या माझ्या, हो माझ्या. ज्या आईने हे पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू? हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती सोशिकता, ती मधुरता, माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट होवो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्प शक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने होवो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही होवो." {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:श्यामची आई]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] pwzitc3vierwx4jfjj5yzolkagqn4od सोनसाखळी/सोनसाखळी 0 5367 36933 36343 2026-10-09T11:19:33Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36933 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = सोनसाखळी/सोनसाखळी | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[सोनसाखळी/बहीणभाऊ]] | पुढील = [[सोनसाखळी/दगडफोड्या]] | वर्ष = | टिपण = }} <poem> एक होता गाव. त्या गावात एक गृहस्थ राहत होता. त्याला एक मुलगी होती. त्या मुलीचे नाव सोनसाखळी. सोनसाखळी लहान असतानाच तिची आई मेली. सोनसाखळीच्या बापाने दुसरे लग्न केले. सोनसाखळी बापाची लाडकी होती. तो आपल्याजवळ तिला जेवायला घेई, आपल्या जवळ निजायला घेई, तिच्या जवळ कितीतरी खेळ, किती बाहुल्या, किती बुडकुली. बाप सोनसाखळीला नवीन नवीन परकर शिवी, छान छान झबली शिवी. तिच्यासाठी त्याने कितीतरी दागिने केले होते. सोनसाखळीचा असा थाट होता. जेवायला बसताना रंगीत पाट, पाणी पिण्याला रुप्याची झारी. जेवताना सोनसाखळी बापाला म्हणे, "बाबा, मला भरवा. मी मोठी झाल्ये म्हणून काय झाले?" मग प्रेमाने बाप तिला घास देई. सोनसाखळीचा बाप एकदा काशीस जावयास निघाला. ते जुने दिवस. सहा महिने जायला लागत, सहा महिने यायला लागत. बाप सोनसाखळीच्या सावत्र आईला म्हणाला, "हे बघ, मी दूर जात आहे. माझ्या सोनसाखळीस जप. आईवेगळी पोर. तिला बोलू नको, मारु नको. पोटच्या मुलीप्रमाणे तिचे सारे कर." सावत्र आई म्हणाली, "हे मला सांगायला हवे? तुम्ही काळजी नका करु. सोनसाखळीचे सारे करीन. तिला गुरगुट्या भात जेवायला वाढीन, कुशीत निजायला घेईन. न्हाऊमाखू घालीन, वेणीफणी करीन. जा हो तुम्ही. सुखरुप परत या." सोनसाखळीचा बाप गेला. सावत्र आईचा कारभार सुरु झाला. ती सोनसाखळीचा छळ करु लागली. लहान कोवळी सोनसाखळी. परंतु तिची सावत्र आई तिला पहाटे थंडीत उठवी. सोनसाखळी झाडलोट करी, भांडी घाशी. ती विहिरीवरुन पाणी आणत असे. तिला पोटभर खायला मिळेना. शिळेपाके तिला तिची सावत्र आई वाढत असे. रात्री पांघरायलाही नसे. सोनसाखळी रडे. परंतु रडली तर तिला मार बसत असे. एक दिवशी तर तिच्या कोवळ्या हाताला सावत्र आईने डाग दिला. फुलासारखा हात, त्याच्यावर त्या दुष्ट आईने निखारा ठेवला. असे हाल सुरु झाले. सोनसाखळी बापाला घरी आल्यावर हे सारे सांगेल अशी भीती सावत्र आईस वाटत होती. म्हणून एके दिवशी रात्री तिने सोनसाखळीस ठार मारले. एका खळग्यात तिचे तुकडे पुरण्यात आले. त्या खळग्यावर सावत्र आईने डाळिंबाचे झाड लावले. काशीहून बाप परत आला. त्याने मुलीसाठी नानाप्रकारची खेळणी आणली होती. लहानशी चुनडी आणली होती. परंतु सोनसाखळी सामोरी आली नाही. सावत्र आई एकदम डोळ्यांत पाणी आणून म्हणाली, "गेली हो आपली सोनसाखळी! तिला कमी पडू दिले नाही. देवाची इच्छा, तेथे कोणाचे काय चालणार?" बाप दुःखी झाला. त्याला सारखी मुलीची आठवण येई. जेवताना, झोपताना डोळ्यांसमोर सोनसाखळी येई. तिची खेळणी तो जवळ घेऊन बसे व रडे. बाप आंघोळीसाठी त्या झाडाजवळ बसे. ते डाळिंबाचे झाड मोठे सुरेख वाढत होते. कशी कोवळी कोवळी तजेलदार पाने. काय असेल ते असो. बापाचे त्या झाडावर प्रेम बसले. तो त्या झाडाची पाने कुरवाळीत बसे. त्या झाडाला फुले आली. परंतु सारी गळून एकच राहिले. त्या फुलाचे फळ झाले. फळ वाढू लागले. वाढता वाढता डाळिंब केवढे थोरले झाले! लोकांना आश्चर्य वाटले. लोक येत व बघून जात. बाप त्या डाळिंबाला दोन्ही हातांनी धरी व कुरवाळी. शेवटी ते डाळिंब पिकले. बापाने तोडले व घरात आणले. गावातील मंडळी ओटीवर जमली. केवढे मोठे डाळींब. कलिंगडा एवढे होते. बापाने ते डाळिंब फोडण्यासाठी हातात घेतले. तो फोडणाच तोच आतून गोडसा आवाज आला, "हळूच चिरा, मी आहे हो आत." असा तो आवाज होता. सर्वांना आश्चर्य वाटले. बापाने हलक्या हाताने डाळिंब फोडले. आतून सोनसाखळी बाहेर आली. बाहेर येताच एकदम मोठी झाली. तिने बापाला मिठी मारली. "बाबा, बाबा, पुन्हा मला सोडून नका हो जाऊ." ती म्हणाली. सोनसाखळीने सारी हकीगत सांगितली. बापाला राग आला. परंतु सावत्र आई म्हणाली, "मला क्षमा करा. पाप कधी लपत नाही, असत्य छपत नाही, मला कळले. मी नीट वागेन." पुढे ती खरोखरच चांगल्या रीतीने वागू लागली. सोनसाखळी सुखी झाली. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:सोनसाखळी]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] 526di9knz6q6tatjts81y09g73imq2e सोनसाखळी/मुले म्हणजे देवाची ठेव 0 5369 36932 36327 2026-10-09T11:19:33Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36932 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = सोनसाखळी/मुले | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[सोनसाखळी/दगडफोड्या]] | पुढील = [[सोनसाखळी/खरा भक्त]] | वर्ष = | टिपण = }} <poem> एक होता राजा. तो रस्त्याने जात असता वाटेत जर लहान मुले भेटली तर त्यांना नमस्कार करी. राजा म्हाताऱ्या लोकांना नमस्कार करीत नसे. परंतु मुलांसमोर मात्र लवे. लोकांना याचे आश्चर्य वाटे. हळूहळू लोक राजाला वेड लागले असे म्हणू लागले. गोष्ट प्रधानाच्या कानावर गेली. त्याच्या मनात आले की, राजाला आपण सारे सांगावे. एके दिवशी तो मुद्दाम उजाडताच राजाला भेटावयास गेला. राजाने विचारले, "आज इतक्या लवकर काय काम आहे?" प्रधान म्हणाला, "महाराज मला तुम्हाला काही विचारावयाचे आहे." राजा म्हणाला, "विचारा. संकोच करु नका." प्रधान म्हणाला, "महाराज, तुम्ही वेडे झाले आहात असे सारे लोक म्हणतात." राजा म्हणाला, "का बरे? मी कुणाच्या घरांना आगी लावित नाही. कोणाचे नुकसान करीत नाही. दुसरे देश लुटित नाही. प्रजेवर वाटेल तसे कर लादित नाही. मग मला वेडा का म्हणतात?" प्रधान म्हणाला, "महाराज आपण दयाळू आहात, न्यायी आहात, सारे खरे. आपल्या कारकीर्दीत खेडोपाडी रस्ते झाले, विहिरी झाल्या, पाट झाले, उद्योगधंदे आहेत, सारे शिकलेले आहेत. न्याय आहे, नीती आहे. ते सारे खरे पण.." राजा म्हणाला, "पण काय? कोणती माझी चूक झाली, कोणते अविचाराचे कृत्य झाले?" प्रधान म्हणाला, "महाराज, तुम्ही रस्त्यातून जाताना शेंबड्या लहान पोरांना वाकून लवून नमस्कार करता. परंतु वृद्धांना कधी करीत नाही. नमस्कार करायचाच झाला तर म्हाताऱ्या मंडळीस करावा. लहान मुलांना का कोणी नमस्कार करतो?" राजाने हसून विचारले, "म्हणून का मी वेडा?" प्रधान म्हणाला, "लोक असे म्हणतात, राजा पोराबाळांना प्रणाम करतो. राजाला वेड लागले." राजाने उत्तर दिले, "मी वेडा नाही. लोकांनाच कळत नाही. मी करतो ते बरोबर करतो." प्रधानाने विचारले, "ते कसे काय?" राजा म्हणाला, "जे लोक म्हातारे झाले, त्यांचा पराक्रम कळून चुकला. ते काय करणार, काय नाही, सारे जगाला कळले. त्यांची कर्तबगारी काय ती दिसून आली. परंतु लहान मुलांचे अद्याप सारे दिसावयाचे असते. लहान मुले पाहिली म्हणजे माझ्या मनात येते यांच्यातून उद्या कोण निर्माण होईल, कोणास ठाऊक? यांच्यातून मोठे कवी निघतात, चित्रकार निघतात, वीर निघतात, मुत्सद्दी निघतात, साधुसंत निघतात का मोठे शास्त्रज्ञ निघतात? काय सांगावे? सारे शक्य आहे. म्हणून मी मुलांना वंदन करतो. त्यांच्यातील अप्रकट शक्तीला नमस्कार करतो." प्रधान म्हणाला, "महाराज आपले करणे बरोबर आहे. आम्हीच वेडे. आपण शहाणे आहात, दूरचे बघणारे आहात." राजा म्हणाला, "म्हणून तर लहान मुलांची काळजी घेतली जावी म्हणून मी खटपट करतो. त्यांच्यासाठी फुलबागा आहेत, त्यांच्यासाठी क्रीडांगणे आहेत. त्यांच्यासाठी नाना वस्तूंची संग्रहालये आहेत. शाळांतून त्यांना गायीचे दूध मिळेल अशी व्यवस्था केली. मुलांमधील देव प्रकट होतो. मुलांची जीवने नीट फुलून त्याचा सुगंध पसरो. मुले म्हणजे देवाची ठेव. हिला जपले पाहिजे. प्रधान म्हणाला, "खरे आहे महाराज. आता लोकांना मी समजावून सांगेन. इतके दिवस बालदिन पाळतात परंतु मुलांचे महत्त्व त्यांना कळले नाही. मलाही कळले नाही. आम्ही सारे वरवर पाहणारे लोक. बरे जातो." {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:सोनसाखळी]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] lsa91yw6id1uefzi7v69zmslkd8zb04 सोनसाखळी/खरा भक्त 0 5370 36931 36371 2026-10-09T11:19:33Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36931 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = सोनसाखळी/खरा भक्त | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[सोनसाखळी/मुले म्हणजे देवाची ठेव]] | पुढील = [[सोनसाखळी/सदिच्छेचे सामर्थ्य]] | वर्ष = | टिपण = }} <poem> एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते. ते स्वयंभू स्थान होते. काळीभोर शंकराची पिंडी होती. त्या गावाच्या राजाची देवावर फार भक्ती. त्याने त्या देवाला सोन्याचा मुखवटा केला होता. शिवरात्रीच्या उत्सवात, श्रावण सोमवारी तो मुखवटा चढविण्यात येई. हजारो लोक पाहायला येत. राजा रोज देवाच्या पूजेला जात असे. "पाहि मां पाहि मां" म्हणत असे. राजाकडची ती पूजा. तिचा थाट किती वर्णावा! किती सांगावा? सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत. बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत. चंदनाचा सुवास सुटलेला असे. उदबत्यांचा घमघमाट असे. ओवाळायला कापूर असे. बाहेर चौघडा वाजत असे. अशा थाटाने पूजा होई. त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला. तो फार कोणाशी बोलत नसे. देवा शंकराला प्रदक्षिणा घालीत असे. आसन मांडून जप करीत बसे. तो झाडाचा पाला फक्त खाई. जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई. असा त्याचा कार्यक्रम असे. एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला. देवा शंकराच्या दर्शनास गेला. संन्यासी शांतपणे बसला होता. "महाराज, आपणाला एक प्रश्न विचारु का?" त्या माणसाने विचारिले. "विचारा." संन्यासी म्हणाला. "तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात. देवाच्या पूजेला, देवाच्या दर्शनाला रोज किती तरी लोक येतात. त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण?" "खरे सांगू का?" "खरे सांगा. दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय पर्वा?" "खरे आहे. ऐका तर. तेथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो. तो, देवा शंकराचा खरा भक्त." "हो." "त्याला वेदमंत्र येत नसतील. जपजाप्य करीत नसेल तो. पूजा तरी कशाने करणार? कोठून आणील गंध? कोठून आणील नीरांजन? येथे राजा रोज पूजेसाठी येतो. कशी घवघवित दिसते ती पूजा. किती माळा, किती कापूर. त्या राजापेक्षाही का तो गुराखी मोठा भक्त? "हो; पुन्हा पुन्हा काय सांगू?" "महाराज, तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही." "उद्या प्रचीती दाखवितो. राजा पूजा करील त्यावेळेस व गुराखी दुपारी येईल त्या वेळेस तुम्हीही येथे असा." "अवश्य येईन." तो मनुष्य निघून गेला. संन्यासी आपल्या कर्मात रमला. दुसरा दिवस उजाडला. तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला. काही वेळाने राजा आला. चौघडा वाजू लागला. सनया आलापू लागल्या. महापूजा सुरु झाली. माळा चढविण्यात आल्या. कापूर पेटवून राजा ओवाळू लागला. इतक्यात काय झाले? ते देऊळ एकदम हलू लागले. भूकंप होणार असे वाटले. राजा घाबरला. दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले. त्याच्या हातातील ती हलकारती खाली पडली. कोठले ओवाळणे, कोठली पूजा. राजा धूम पळत सुटला. राजाच्या बरोबरचे सारे पळत सुटले. ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली. दुपारची वेळ झाली. तो गुराखी आला. त्याच्या गाई रानात चरत होत्या. तो देवाच्या दर्शनाला आला. तो गाभाऱ्यात शिरला. पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली. नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य देवासमोर ठेवला. क्षणभर त्याने डोळे मिटले. आणि तेथेच ती [[कांदा]]भाकर खाऊ लागला. आईच्या जवळ बसून जेवू लागला. देव म्हणजे सर्वांची आई ना? इतक्यात ते देऊळ हलू लागले. दगड डोक्यावर पडणार असे वाटले. हातातील भाकरी हलू लागली. भूकंप होणार असे वाटले. परंतु त्या गुराख्याने काय केले? तो पळाला का? त्याने धूम ठोकली का? नाही. त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली. "देवा, सांभाळ." असे तो म्हणाला. देऊळ हलायचे थांबले. गुराख्याला आनंद झाला. त्याने भाकरी पोटभर खाल्ली. देवाला नमस्कार करुन पुन्हा रानात गेला. गाईसाठी बासरी वाजवू लागला. प्रचीती ज्याला हवी होती तो मनुष्य तेथे होता. "पटले की नाही?" संन्याशाने विचारले. "राजा पळून का गेला? गुराखी तेथेच का राहिला?" "अरे, राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता, ती पिंडी त्याला खरोखर देवाची वाटत होती का? देऊळ हलू लागताच तो पळाला. देव जवळ असता तो पळाला का? संकटात देवाशिवाय कोण तारणार? परंतु ही पिंडी रक्षण करील असे त्याला वाटले नाही. त्याने स्वतःच्या पायांवर अधिक विश्वास ठेवला. ती पिंडी म्हणजे केवळ दगड. हीच त्याची शेवटी भावना झाली. परंतु तो गुराखी? देऊळ हलू लागताच पळाला नाही. त्याने पिंडीलाच मिठी मारली. संकटात लहान मूल आईला बिलगते. तो गुराखी देवाला बिलगला. त्याला ती पिंडी म्हणजे दगड वाटला नाही. त्याला तेथे खरोखर देव दिसत होता. ती पिंडी परमेश्वराची, देवा महादेवाची आहे, असे त्याला खरोखर वाटत होते. त्याचा खरा भाव होता, त्याची खरी भक्ती होती. त्याच्या पूजेत फुले नसतील, कापूर नसेल, चंदन नसेल. परंतु सर्व सुगंधांहून थोर असा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता. आता पटले ना?" संन्याशाने शेवटी विचारले. "होय महाराज." असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:सोनसाखळी]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] rkn28cp2s6eo6o66b19gyraw7wlq8e3 सुंदर कथा/न्याय जिवंत झाला! 0 5374 36934 36334 2026-10-09T11:19:33Z QueerEcofeminist 1879 Adding link to [[पांडुरंग सदाशिव साने]] 36934 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = सुंदर कथा/न्याय जिवंत झाला! | साहित्यिक = [[पांडुरंग सदाशिव साने]] | विभाग = | मागील = = [[सुंदर कथा]] | पुढील = [[सुंदर कथा/शहाणा झालेला राजपुत्र]] | वर्ष = १९४१ | टिपण = }} "मग तू देतोस की नाही तुझे शेत? मी म्हणून तुला इतकी किंमत देत आहे. अरे, आजूबाजूला आता सगळीकडे माझी जमीन! मध्ये तुझेच हे शेत आडवे येते. मी सांगतो ऐक. आढेवेढे नको घेऊस!" केशवचंद्र म्हणाले. "माझी जमीन विकणार नाही. गावातली सगळी जमीन तुम्ही या ना त्या मार्गाने आपलीशी केलीत. आता माझ्या या सोन्यावाणी तुकड्यावरही तुमची गिधाडी दृष्टी आली. राग नका मानू दादा; परंतु खरे ते मी सांगतो. वाडवडिलांपासून चालत आलेली ही जमीन. ही का मी विकू? जमीन म्हणजे आई. आईला का कोणी विकतो? राहू द्या एवढी जमीन. पोटापुरे ती देते. मुलेबाळे तेथे येतात, खपतात, खेळतात. सत्तेची जमीन सोडू नये, दादा!" भीमा म्हणाला. "भीमा, जमीन नाही ना देत?" "कशी द्यायची?" "द्यायची की नाही ते सांग!" "नाही, त्रिवार नाही!" "याद राख! तुझी ही मगरूर वृत्ती तुला मातीत मिळवल्याशिवाय राहणार नाही. माझी गिधाडी दृष्टी तुला भिकेला लावल्याशिवाय राहणार नाही!" "देव काही मेला नाही, केशवबाबा!" "जेथे सत्ता नि संपत्ती असते तेथे देव असतो, समजलास! देव माझ्या तिजोरीत आहे!" "माझा देव सर्व जग व्यापून राहिलेला आहे!" "बघतो तुला वाचवायला कोण देव येतो ते! हे तुझे शेत गेले समज आणि तुला पैही न मिळता. आज मी तुला तू मागशील ती किंमत द्यायला तयार झालो होतो; परंतु तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू तरी काय करशील? ठीक तर!" असे धमकीचे भाषण करून केशवचंद्र निघून गेले. शेतातील विहिरीच्या काठी भीमा बसला होता. त्याचे ते लहानसे शेत; परंतु खरेच सोने पिकवी. भीमाच्या वाडवडिलांच्या हातची तेथे झाडे होती. त्यानेही दोन-चार कलमे लावली होती. विहिरीच्या कडेला फुलझाडे होती. पलीकडे त्याचा लहानसा गोठा होता. भीमाचा शब्द ऐकताच गोठ्यातील गाय हंबरायची. खरोखरच त्या शेतावर भीमाचे जीव की प्राण प्रेम होते. ते विकणे त्याच्या जिवावर येत होते. केशवचंद्रांनी गावातील जवळजवळ सारी जमीन गिळंकृत केली होती. सावकारी पाशात सारे शेतकरी सापडले. पाचाचे दहा झाले, दहाचे शंभर झाले आणि मग ते देणे कधी फिटायचे? शेताचे मूळचे मालक मजूर झाले. अजून हा भीमाच काय तो तेथे स्वाभिमानाने आपल्या शेताचा मालक म्हणून नांदत होता. केशवचंद्रांना ते सहन होत नव्हते. गोडीगुलाबीने भीमा शेत विकतो का ते ते बघत होते; परंतु काही केल्या जमेना. आज सकाळी ती शेवटची बाचाबाची झाली. सावकार का ही जमीन लाटणार? या जमिनीचा मी मालक. उद्या मला येथे मजूर म्हणून का कामासाठी यावे लागेल? भीमा विहिरीच्या काठी बसून विचार करीत होता. त्याचे तोंड चिंतेने जरा काळवंडले. इतक्यात त्याची वडील मुलगी भीमी लहान भावंडाला घेऊन आली. "बाबा, आईने घरी बोलावले आहे." ती म्हणाली. "कशाला ग, पोरी?" "सावकार आला आहे घरी." "काय म्हणतो तो?" "आईला म्हणाला, 'हजार रुपये घ्या व शेत द्या!' आणि मला म्हणाला, 'तुझ्या बापाला काही कळत नाही.' बाबा, शेत का तुम्ही विकणार?" "प्राण गेला तरी विकणार नाही. तुझी आई काय म्हणाली?" "ती म्हणाली, 'त्यांना विचारा.' आणखी आई त्यांना म्हणाली, 'पैसे काय, आज आहेत उद्या नाहीत, जमीन कायमची सत्तेची. ती विकून कुठे जायचे?' " "शहाणी आहे तुझी आई!" भीमा मुलीबरोबर घरी आला. सावकार निघून गेला होता. बायकोने सारी बोलणी भीमाच्या कानावर घातली. "साप आहे तो मेला! तो आपला सत्यानाश केल्यावाचून राहणार नाही!" तो म्हणाला. "गावातील सारे शेतमालक मजूर झाले. त्यांच्या बाबतीत देव मेला, तसा आपल्या बाबतीतही मरायचा!" "त्यांनी हिंमत सोडली म्हणून त्यांचा देव मेला! जो सत्यासाठी उभा राहतो त्याचा देव मरत नाही. समजलीस?" काही दिवस गेले. केशवचंद्राने न्यायालयात फिर्याद केली. भीमाकडे असलेली जमीन वास्तविक आपली आहे. जुने कागदपत्र सापडले आहेत त्यावरून हे सिद्ध होत आहे, वगैरे त्याचे म्हणणे. न्यायाधीश केशवचंद्रांच्या मुठीतले. पैशाने कोण वश होत नाही! भीमाला न्यायालयात बोलावण्यात आले. केशवचंद्राने म्हातारे शेतकरी पैशाने विकत घेऊन साक्षीदार म्हणून आणले होते. त्याने आपली बाजू मांडण्यासाठी कायदेपंडितही आणला होता. भीमाची बाजू कोण मांडणार? तो न्यायाधीशास एवढेच म्हणाला, "महाराज, देवाधर्माला स्मरून मी सांगतो की ही माझी जमीन आहे. वाडवडिलांपासून ही चालत आली आहे. सावकाराला बघवत नाही. हजार रुपये द्यायला तयार झाला होता..." "हजार रुपये? थापा मार! त्या तुकड्याचे का कोणी हजार रुपये देईल?" "देवाला माहीत आहे!" "देव दूर आहे आभाळात. येथे तुम्ही आम्ही आहोत. कागदपत्रं काय सांगतात? हे म्हातारे शेतकरी साक्षीदार का खोटे सांगतात?" वकील म्हणाला. न्यायाधीशाने भीमाची मालकी काढून घेतली. केशवचंद्राचीच जमीन आहे, असा त्याने निर्णय दिला. भीमा बाहेर येऊन आकाशाकडे हात करून म्हणाला, "तुझ्या जगात देवा, का न्याय नाही?" "न्याय आमच्या हातात असतो, भीमा. देवबीव सत्तेजवळ असतो, संपत्तीजवळ असतो." वकील कुऱ्याने म्हणाला. भीमा दु:खाने घरी गेला. तो कपाळाला हात लावून बसला. "काय लागला निकाल?" बायकोने विचारले. "आपण चोर ठरलो नि चोर मालक ठरला. आपण उद्यापासून मजूर झालो." तो दु:खाने बोलला. त्या गावातील सारे गोरगरीब केशवचंद्रांच्या नावे खडे फोडीत होते. परंतु करतात काय? या प्रांताचा राजा दौऱ्यावर निघाला होता. केशवचंद्राने वशिला लावून राजा आपल्या गावी येईल असे केले. गाव शृंगारण्यात आला आणि एक सुंदर सभामंडप उभारण्यात आला. तेथे राजासाठी सिंहासन तयार करण्यात आले होते. राजाच्या सत्कारसमारंभासाठी आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील शेकडो मोठमोठी माणसे येणार होती. सरदार-जहागीरदार, सावकार, व्यापारी येणार होते. तेथे फक्त गरिबांना येण्यास बंदी होती. केशवचंद्राला गावातील लोकांची भीती वाटत होती. राजाच्या कानावर ते कागाळ्या घालतील, अशी त्याला शंका होती. म्हणून त्याने सर्वांना ताकीद दिली की, त्या दिवशी घराबाहेर फिरकू नका. राजा जाईपर्यंत आपापल्या झोपड्यांत बसून राहा. सभामंडप भरून गेला होता. आजूबाजूच्या पाचपन्नास कोसांतील साऱ्या संपत्तीचे तेथे जणू प्रदर्शन होते. नटूनथटून श्रीमंत मंडळी आली होती. आणि बारा वाजले. राजा आला वाटते? हां, हे बघा घोडेस्वार! आणि वाद्ये वाजू लागली. जयघोष कानावर आले. सारे शेतकरी भीतीने घरात बसून आहेत; परंतु भीमा कुठे आहे? गावाबाहेर एक जुने देवीचे मंदिर होते. त्या मंदिरात एक प्रचंड घंटा होती. गावात कोणी मेले, तर ती घंटा वाजविण्यात येई. भीमा आज त्या मंदिरात गेला आणि ती घंटा दाणदाण वाजवू लागला. "कोण मेले?" म्हाताऱ्या गुरवाने विचारले. "न्याय मेला." भीमा म्हणाला. "खरेच, न्याय उरला नाही." देवीचा तो पुजारी म्हणाला. घंटेचा आवाज ऐकून देवीच्या देवळाकडे शेतकरी येऊ लागले, 'कोण मेले' म्हणून विचारू लागले. 'न्याय मेला' असे जो तो उत्तर देऊ लागला. "मोठ्याने घंटा वाजवा. न्याय मेला!" तरुण म्हणू लागले. एक थकला की दुसरा वाजवू लागे. तो थकला की तिसरा. सारा गाव दणाणून गेला. तिकडे सभामंडपात राजाचा सत्कार होत होता. मानपत्र वाचले जात होते. परंतु त्या घंटेचा दाणदाण आवाज तेथे ऐकू येत होता आणि मानपत्र मात्र कोणालाच ऐकू जाईना. "कसला हा आवाज?" राजाने विचारले. "कोणी तरी मेले असावे. गावचा रिवाज आहे की, कोणी मेले तर घंटा वाजवायची." केशवचंद्र नम्रपणे म्हणाला. "आमचे येणे म्हणजे अपशकुनच झाला म्हणावयाचा. कोण मेले, चौकशी तरी करा." राजा म्हणाला. दोन घोडेस्वार चौकशीसाठी पाठवण्यात आले. देवीच्या देवळाजवळ अपार गर्दी होती. "काय आहे भानगड? कोण मेले!" घोडेस्वारांनी विचारले. "न्याय मेला!" लोक गर्जले. ते घोडेस्वार आश्चर्य करीत आले. त्यांनी येऊन राजाला सांगितले, "महाराज, न्याय मेला!" "मी जिवंत आहे तोवर न्याय कसा मरेल? चला, मला पाहू दे काय आहे भानगड ती!" राजा रथातून निघाला, त्याबरोबर सारेच निघाले. कोणी घोड्यावरून, कोणी पायी निघाले. तिकडे भीमाने काय केले ते ऐका. तो लोकांना म्हणाला, "आपण न्यायदेवाची एक प्रतिमा करून ती तिरडीवर ठेवू या. खांद्यावरून ती नेऊ या. 'न्याय मेला, हाय हाय; न्याय मेला, हाय हाय' असे दु;खाने म्हणू या!" सर्वांना ती कल्पना आवडली. एक तिरडी तयार झाली. तिच्यावर न्यायदेवतेची एक प्रतिमा निजवण्यात आली. खांद्यावर घेऊन लोक निघाले. 'न्यायदेव मेला, हाय हाय,' असे करीत ती प्रेतयात्रा निघाली. तिकडून राजा हजारो शेटसावकारांसह, शेकडो सरदारजहागीरदारांसह येत होता आणि इकडून ती न्यायदेवाची प्रेतयात्रा येत होती. दोघांची वाटेत गाठ पडली. राजा रथातून खाली उतरला व तो शेतकऱ्यांकडे जाऊन म्हणाला, "तुम्ही हे काय म्हणता? मी जिवंत असताना न्याय कसा मरेल?" "या गावात तरी न्याय नाही!" भीमा म्हणाला. "काय आहे तुमची तक्रार?" राजाने विचारले. "महाराज, या गावचे शेतमालक आज मजूर झाले. ज्या केशवचंद्राने तुमचे स्वागत आज मांडले आहे, त्यानेच आमचे संसार धुळीला मिळविले. पाचाचे पन्नास केले नि साऱ्या जमिनी तो बळकावून बसला. महाराज, या गावातील सर्वांच्या जमिनी गेल्या तरी माझी उरली होती. केशवचंद्र म्हणे, 'हजार रुपये घे परंतु ती मला विकत दे!' मी जमीन विकायला तयार नव्हतो. तेव्हा खोटा खटला भरून माझ्याजवळून जमीन हिसकावून घेण्यात आली. न्यायाधीश पैशांचे मिंधे. वकील म्हणाला, 'देव आकाशात नसतो, पैशाजवळ असतो!' महाराज, खरेच का देव उरला नाही? न्याय उरला नाही? तुमच्याभोवती दागदागिन्यांनी सजलेली ही बडी मंडळी आहेत, आणि ही इकडची गरीब मंडळी पहा. या आयाबाया, ही आमची मुले. ना पोटभर खायला, ना धड ल्यायला. कसे जगावयाचे? श्रमणारे आम्ही. परंतु आम्हीच मरत आहोत. आम्ही सारे पिकवतो आणि हे खुशालचेंडू पळवतात. न्याय, कोठे आहे न्याय? वाडवडील म्हणत, 'जो नांगर चालवील तो खरा मालक.' परंतु आज गादीवर बसणारा मालक ठरला आणि आम्ही श्रमणारे चोर ठरलो, अन्नाला महाग झालो. महाराज, कोठे आहे न्याय? या केशवचंद्राने आम्हाला आज घरातून बाहेर पडू नका म्हणून बजावले. आम्ही तुमच्या कानांवर गोष्टी घालू अशी त्याला भीती वाटली; परंतु मला घंटेची आठवण झाली. न्याय मेला, तुम्हास कळवावे म्हणून आम्ही सारे घंटा वाजवीत बसलो." "चला त्या मंडपात. मी सारी चौकशी करतो." राजा म्हणाला. सारी मंडळी सभामंडपात आली. एकीकडे श्रीमंत बसले. एकीकडे गरीब बसले. राजाने सारी चौकशी केली. केशवचंद्राचे गुन्हे सिद्ध झाले. तो पैसेखाऊ न्यायाधीश, तो वकील, सारे तेथे अपराधी म्हणून उभे राहिले. "यांना कोणती शिक्षा देऊ? तोफेच्या तोंडी देऊ?" राजाने विचारले. "त्यांना मारण्याची जरुरी नाही. ते आमच्यात राहोत. आमच्याबरोबर खपोत, श्रमाचे खावोत, त्यांची बुद्धी आमच्या कामी पावो, आमचा हिशोब ठेवोत. महाराज, या गावची जमीन साऱ्या गावाच्या मालकीची असे करा. सारे मिळून श्रमू. येथे स्वर्ग आणू. येथे नको कोणी उपाशी, नको कोणी चैन चालवणारा." भीमा म्हणाला. "तुमचा प्रयोग यशस्वी करा. भरपूर पिकवा. नवीन नवीन उद्योग शिका. तुमचा गाव आदर्श करा. तुम्हाला छळणाऱ्यांवरही तुम्ही सूड घेऊ इच्छित नाही, ही केवढी उदारबुद्धी! मला राजालाही आज तुम्ही खरी दृष्टी दिलीत. सूडबुद्धीनं शेजारच्या राजाशी मी युद्ध करायच्या विचारात होतो; परंतु आता दुसऱ्या भल्या मार्गाने जाईन. शाबास तुमची! तुमचे समाधान झाले ना?" राजाने प्रेमाने विचारले. "होय, महाराज!" लोक आनंदाने उद्गारले. "मग आता काय घोषणा कराल?" राजाने विचारले. "न्याय मेला होता, परंतु जिवंत झाला, अशी घोषणा करू." लोक म्हणाले. राजा निघून गेला. केशवचंद्र व भीमा प्रेमाने एकमेकांस भेटले. तो गाव सुखी झाला, तसे आपण सारे होऊया. {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:कथा]] [[वर्ग:सुंदर कथा]] [[वर्ग:मराठी विकिस्रोतावरून स्थानांतरीत लेख]] d59fhdw4w94cdv8arprcd0i4hkt8smv