विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.2
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:Paripurti.pdf/8
104
20830
229989
109711
2026-05-16T06:30:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229989
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{RunningHeader|१० / परिपूर्ती}}</noinclude>ती वरील वाक्य बोलली. म्हातारी म्हणजे एक लहानशीशी, नाजुक-साजुक, बाहुलीच होती जणू. तिचे पांढरे शुभ्र केस, गोरा-गोरा वर्ण, किंचित सुरकुतलेले तोंड, तिचा नीटनेटका श्रीमंती पोशाक- मागच्या पिढीचा नमुना म्हणून संग्रहालयात ठेवण्याजोगी होती ती. मी स्नेहभराने तिच्या खांद्यावर हात ठेवला व आश्चर्याने विचारले, "पण आजी, मी केलं तरी काय? तुला रागवायला झालं तरी काय?", "म्हणे रागवायला काय झालं? तू आल्या दिवसापासून मी पाहते आहे, तुझा मुका घेतला की तू ताबडतोब गाल पुसून टाकतेस. इतकी का तुला घाण वाटते? का तू ब्राह्मण म्हणून तुला विटाळ होतो?" मी चकित झाले. खरंच का मी गाल पुसून टाकीत होते? मग ही क्रिया अगदी मला नकळत होत असली पाहजे. "मी जाणूनबुजून नव्हते गं तसं करीत." मी थोडी थांबले व पुढे म्हणाले, "किनी आमच्यात अशा चाल नाही. नकळत अपराध झाला. तुझा अपमान करणे माझ्या स्वप्नातसुद्धा येणार नाही हो! त्यातून तू तर नवऱ्याची आजी म्हणजे तुला केवढा मान द्यायला पाहिजे!" म्हातारीचे एवढ्यावर समाधान झाले. ती चौकस होती व वाचणारीही. हिंदू रीतिरिवाज, नातीगोती, तिला थोडथोडी माहीत होती. आम्ही हातात हात अडकवून घरात जात असताना तिने विचारले, "काय ग, तुझ्या सासूनं तुझा मुका घेतला तर काय करतेस गं?" तिच्या प्रश्नाने मला हसूच लोटले. मी म्हटले, "माझी सासू तर मुका घेणार नाही, पण माझी आईसुद्धा एवढ्या मोठ्या लेकीचा मुका घेणार नाही." आता चकित होण्याची तिची पाळी होती.

{{gap}}ह्यानंतर काही दिवसांनी मी लाइपझिगला गेले. तेथे ज्या कुटुंबात माझा नवरा राहिला होता तेथे मी महिनाभर राहावयाची होते. कुटुंबवत्सल घर होते. वृद्ध आईबाप व पाच मुलगे आणि चार मुली असा मोठा परिवार होता. मी गेल्यावर वृद्ध जोडप्याने व मुलींनी माझे मुके घेऊन स्वागत केल. बाकीच्यांनी सुदैवाने करपीडनावरच भागवले. थोरल्या मुलाचे नुकते लग्न झाले होते व सूनही चार दिवस राहावयास आली होती. रात्री निजायला जाताना तिने सासरच्या प्रत्येक माणसाचा निरोप घेतला. जाताना "जाते हं, आई- जाते हं, बाबा-" सासु-सासऱ्यांचा मुका घेतला. नंतर आपल्यापेक्षा लहान दिरांचा व नंतर समस्त वन्सं व शेवटी मी. माझे लग्न झाले त्या दिवसाची मला आठवण झाली. माझ्या थोरल्या जाऊबाई सासरच्या मंडळींशी माझी ओळख घालून देत होत्या. "ह्या तुझ्या<noinclude></noinclude>
jm4zdxauzvapou8cuslsrbng2o477i0
पान:Paripurti.pdf/9
104
20831
229990
109712
2026-05-16T06:34:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229990
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{RunningHeader|||परिपूर्ती / ११}}</noinclude>मामेसासूबाई, ह्या तुझ्या मावससासूबाई, हे तुझ्या नवऱ्याचे मामा, हे काका ह्या वन्सं..." अशी एकामागून एक ओळख चालली होती, व मी दरवेळी खाली वाकून नमस्कार करीत आशीर्वाद घेत होते. मनातल्या मनात मी म्हटले, "इतक्या थोरल्या अनोळखी माणसांचे मुके घेण्यापेक्षा नमस्कार करण बर आहे!"
{{gap}}बर्लिनहून मी अधूनमधून एखाद-दोन दिवस लाइपझिगला येत असे, पण सबंध सुटीभर राहावयास अशी जवळजवळ वर्षाने आले. एवढ्या अवधीत रीया (थोरली सून) ला छानसे बाळ झाले होते. मी तर आता अगदी घरचीच झाले होते. आल्याबरोबर म्हटले, "गडे रीया, तुझं बाळ गुलाबी गुलाबी, लठ्ठ-लठ्ठ, मऊ, लुसलुशीत! पाहिले की वाटे. संबंध खावे. मी चटदिशी तान्हुल्याला उचलले, हृदयाशी धरले व पटापट त्याच्या गालाचे मुके घेतले. थोड्या वेळाने मला वाटले, आपले काहीतरी चुकले! सारी मंडळी कशी काही धक्का बसल्यासारखी स्तब्ध होती. रीयाने बाळ माझ्या हातून घेऊन बिछान्यावर ठेवले, व आम्ही खोलीबाहेर पडलो. नेहमीप्रमाणे हसतखिदळत जेवणे झाली. दुपारी मी रीयाला विचारले की, सकाळी माझे काही चुकले की काय? तिने माझा हात धरून स्नेहपूर्ण स्वराने सांगितले, "हे बघ बाई, एखादं बाळ पाहिल्यावर असे मुके घेऊ नयेत. आमच्यात ते बरं समजत नाहीत. आज तू सकाळी आपल्या इथे केलंस तर फारशी हरकत नाही, पण लोकांकडे नको हो असं करूस! लहान मुलं ही फुलांसारखी असतात. त्याच्या प्रकृतीला फार जपावं लागतं. मोठ्या माणसानं आपलं तोंड तान्ह्या मुलांजवळ नेऊ नये, नाहीतर पडस, खोकला, क्षय, इत्यादी संसर्गजन्य रोग त्याला होतील. मी सांगितलं ह्याचा राग नाही ना आला तुला?" "छेः! छेः!" मी हसून म्हटले व मला राग आला नाही ह्याची खात्री पटवण्यासाठी अगदी त्यांच्या पद्धतीने तिच्या लठ्ठ गोऱ्या गालांचे सशब्द चुंबन घेतले!
{{gap}}दोन वर्षे तेथे राहून मला वाटले आता पुष्कळच प्रगती झाली आहे. कोणी बायांनी माझा मुका घेतला तर मी गाल पुसून टाकीत नसे. कोणी पुरुषांनी हाताचा मुका घेतला तर तोंड वाईट न करता व लगेच हात न धुता मी तशीच बसून राहात असे. पण मला अजूनही एक आश्चर्याचा धक्का बसायचा होता. माझा नवरा विलायतेला आला होता, व आम्ही दोघे मिळून स्वदेशी परत यावयास निघालो होतो त्या वेळची गोष्ट. आम्ही आगगाडीत<noinclude></noinclude>
l7upycgfc146mn4jj33ymgk77e9ul7w
पान:Paripurti.pdf/10
104
20832
229991
109713
2026-05-16T06:44:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229991
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{RunningHeader|१२ / परिपूर्ती}}</noinclude>तिसऱ्या वर्गाच्या डब्यांत बसलो होतो. गाडी पॅरिसमधील एका स्टेशनवर उभी होती व प्लेटफॉर्मवर प्रवासी व त्यांना पोचवायला आलेली मंडळी ह्यांची एकच गर्दी उसळली होती. आमच्याबरोबरच्या प्रवाशाने माहिती दिली की, ह्या गाडीने खूप तरुण शिपाई लांबच्या वसाहतीला जावयास निघाले आहेत व त्यांना पोचवण्यासाठी फार लांबून कुटुंबातील मंडळी आली आहेत, शिपाई अंगदी पोरसवदाच दिसत होते आणि प्रत्येकाला पोचवायला आईबाप; भावंडे, मामा, चुलता, बायको वा प्रेयसी आणि तिची मातापितरे अशी सात-आठ माणसे तरी दिसत होती. पुरुष गंभीरपणे बालत होते; बायका अधूनमधून रडत होत्या, अधूनमधून हसत होत्या; दर क्षण दोन क्षणांनी मुके घेणे चालले होते आणि विशेष म्हणजे पुरुष-पुरुषही वारकरी भेटतात तसे भेटून एकमेकांचे मुके घेत होते. इतक्यात घंटा झाली. गार्डने हिरवे निशाण दाखवले, आणि लॅटफॉर्मवर निरोप देण्याची एकच गर्दी उसळली. प्रत्येक शिपायावर त्याच्या सर्व नातेवाईकांनी सशब्द मुक्यांचा असा एकदम भडिमार केला की, आम्हीं त्या आवाजाने दचकलोच. चुंबनाचा ध्वनी कधी एवढा मोठा होऊ शकेल ही कल्पनाही तोपर्यंत आम्हाला शिवली नव्हती. आम्हाला जे हसू लोटले ते आवरेच ना. आमच्या शेजारचे लोक म्हणत असतील की, काय पाषणहृदयी हे पौर्वात्य! असल्या करून प्रसंगी रडू येण्याऐवजी ते आपले हंसतचे आहेत!
{{gap}}मी मायदेशी परत आले ती थेट माहेरी आले. आल्याबरोबर वाकून आईच्या पाया पडले. तिच्या डोळ्यातून पूर वाहत होता. माझेही डोळे भरून आले होते. इतक्यात माझे वडील आले. त्यांनाही नमस्कार केला. तो त्यांनी माझे खांदे धरून मला उठवले, माझ्याकडे एकदा नीट पाहिले व मी रडते आहेसे पाहून म्हटले, "अहो जावई, तुम्हाला वाटल की, ही बया विलायतेला जाऊन शहाणी होईल. मी सांगत नव्हतो ही रडूबाई मूर्खच राहणार म्हणून? गेली तश्शी परत आली!" त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली. भावनेने कुंद झालेले वातावरण कसे एकदम लख्ख झाले. सगळीजण हसली. मला काय हुक्की आली कोण जाणे, मी आईजवळ जाऊन हळूच तिच्या गालाचा मुका घेतला. आई चकित होऊन विचारती झाली, "हे गं काय?" मी काही बोलायच्या आतच वडील म्हणाले, 'अग हे विलायती चाळे!"
{{gap}}याहीनंतर काही वर्षे लोटली. आम्ही सर्व भावंडे जमलो होतो.<noinclude></noinclude>
7mc70669t5tdkel5m86wn5l8cotizvv
पान:Paripurti.pdf/11
104
20833
229992
76824
2026-05-16T06:49:43Z
कल्पनाशक्ती
3813
229992
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="दिपक कोतकर" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १३}}</noinclude>मधल्या दिवाणखान्यात गप्पांना रंग भरला होता. संध्याकाळचे बेत चालले होते. एक भाऊ न् वहिनी सिनेमाला जाणार होती; चवथ्याची बायको बाळंत होती तिला भेटायला तो दवाखान्यात जाणार होता. आम्ही दोघे फिरायला जाणार होतो. वडील जाणार होते पत्ते खेळायला आणि आई जाणार होती देवदर्शनाला. आईच्या मनात गेले दोन दिवस काही तरी खळबळ चालली होती. ती जराशी कुरकुऱ्या आवाजात बोलता बोलता म्हणाली, "काय अगदी एक दिवस दवाखान्यात भेटायला गेलं नाही तर ह्यांना चालत नाही!" वडील म्हणाले, "अग, जाऊ दे ग, माझ्या गाडीतून जाईल. मी जाईन आज पायीच. थोडे फिरणंही होईल." आई उसळूनच म्हणाली, "हो, आता त्यांची कौतुकं चालली आहेत. काय म्हणे दोघं सिनेमाला जाताहेत! मला कधी एक दिवस बरोबर नाटकाला नेलं नाहीत. दोघं फिरायला जाताहेत! कधी मी विचारलं, 'येता का?' की शिपायाला म्हणता; 'बाईसाहेबांच्या बरोबर जा.' मी बाळंत होत असे तेव्हा कधी दिवस दिवस माझी विचारपूस केली नाहीत, कधी आत येऊन मूल पाहिले नाहीत! फार तर उंबरठ्यात उभे राहून दुरूनच 'काय? सर्व ठीक आहे ना?' एवढे विचारायचे." बोलता-बोलता आईचा गळा भरून आला. जन्मभर झालेल्या अवहेलनेच्या आठवणीने तिचे मन भरून आले होते. आम्ही सर्व हा प्रकार पाहून ताबडतोब चुपचाप झालो. पण माझे वडील लगेच म्हणाले, "अग, तुझी कल्पना तरी काय आहे? ह्या पोरांच्या वागण्यानं तुला वाटतं, काय बायकोवर ह्यांचे प्रेम आहे म्हणून! आजकालची सर्वजणं करतात ते ती करतात. मी जर तुझ्याजवळ बसून राहिलो असतो. नाहीतर फिरायला गेलो असतो, तर तूच लोक हसतात म्हणून कुरकुरली असतीस. चार लोकाची रीत तीच आपली ठेवावी लागते. पण मी तर रूढीविरुद्ध वागून माझे प्रेम सिद्ध केलं आहे." आम्ही सर्वजण वडिलांच्या तोंडाकडे पाहू लागलो. शेजारी माझे चुलते बसले होते, त्यांच्याकडे वळून ते म्हणाले, "भाऊ, तू सांग पाहू. तू वहिनीला मारलं आहेस की नाही?" भाऊ म्हणाले, "हो! दोन-चारदा मारली असेल." वडील पुढे म्हणाले, “काय गं, तात्या न दादा तर तुझ्यादेखत बायकांना मारीत होते ना? मी साऱ्या जन्मात एकदा तरी हात उगारला आहे तुझ्यावर? दादा, तात्या, भाऊ, सर्व मला बायल्या म्हणत. मी कधी तुला मारलं नाही. मग चार लोक बायकांच्या पुढे पुढे करतात तसं करणाऱ्या ह्या मुलांचं बायकांवरील प्रेम अधिक का चार लोकांच्या<noinclude></noinclude>
lzxs0zd8jc5ms1cpfphl46wscbey50a
पान:Paripurti.pdf/12
104
20834
229993
76826
2026-05-16T06:53:59Z
कल्पनाशक्ती
3813
229993
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="दिपक कोतकर" />{{RunningHeader|१४ / परिपूर्ती}}</noinclude>चेष्टेला न जुमानता तुला मुळीच न मारणाऱ्या माझं प्रेम जास्त?" आमच्या हशात आईचे दुःख कोठच्या कोठे नाहीसे झाले. पण भाऊ एवढ्यावर थोडेच थांबतात! "पण गणू, आम्ही बायकोला मारली म्हणजे आमचे प्रेम नाही असं का तुझं म्हणणं?" "छेः! मी कुठे तसं म्हणतोय? तू तर वहिनीच्या मुठीत होतास, आणि तिला मारली नसतीस तर बरोबरीच्या मुलांत वावरायची सोय नव्हती हे मला कळतं रे! पण ह्या हल्लीच्या पोराना अकलाच नाहीत. आणि त्यांचं पाहून हिला पण काहीतरी सुचतं झाल!"
{{gap}}आमची बैठक मोडली, व आम्ही फिरावयास निघालो तो प्रेमाचा आणखी एक सनातन रीत मला दिसायची होती. रस्त्यालगतच एक झोपडे होते. अंगणात बरीच चिलीपिली खेळत होती. त्यातलेच एकजण, असेल चार-पाच वर्षांचे, खेळत-खेळत रस्त्यावर आले. त्याची आई अंगणातूनच पाहत होती. इतक्यात एक टांगा आला. मुलाच्या अलीकडे लगाम खेचून टांगा थांबला. अंगणातली बाई धावतच पुढे आली. तिने पोराच्या बखोटीला धरून त्याला खस्सदिशी ओढले, दोन-चार रट्टे दिले व म्हटले, "पटकी झाली मेल्याला! कशाला तडफडायला रस्त्यावर गेला होतास रे? आई भवानीची खैर म्हणून वाचलास!"

{{xx-larger|{{right|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
hlf72jib9upcuxchrvfxemfmu7adzd3
पान:Paripurti.pdf/14
104
20836
229994
134013
2026-05-16T07:04:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229994
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="अश्विनीलेले" />{{RunningHeader|१६ / परिपूर्ती}}</noinclude>गौरी धापा टाकीत आली. नेहमीप्रमाणे पुढे न पाहता धडक मारून येत होती. खोलीत येतायेता टेबलाच्या अणकुचीदार कोपळ्यावर आता डोळा आपटणार असे मला दिसले व मी हातातले काम टाकून "अग, अग..." म्हणत उठले तो काय चमत्कार! टेबल गहूभर मागे सरकले व गौरी डोळ्याला न लागता माझ्यासमोर येऊन थडकली. छे! टेबल कसे सरकेल? मला काहीतरीच भास झाला. थोडक्यात पोरगी बचावली खरी. पण टेबल सरकल्यासारखे दिसल्यामुळे मी इतकी बावचळले होते की, मला ती काय सांगत होती ते समजलेच नाही व तिला बोलायचेही मी विसरले. संध्याकाळची वेळ, खोलीच्या मध्यभागी उभा राहून नंदोबा काहीतरी शाळेतली हकीकत अगदी रंगात येऊन सांगत होता. नेहमीच्या सवयीप्रमाणे सारी गोष्ट सांगून होत आल्यावर मागे मागे जात दारातून बाहेर पडणार होता. दाराची एक फळी अर्धवटच उघडी होती व नेहमीप्रमाणेच नंदूचे डोके धाडकन त्यावर आपटणार होते "नंद्या, नंद्या" म्हणून मी ओरडते आहे तो आपले दार हळूच उघडून भिंतीसरसे झाले व नंदोबा सुखरूप दाराबाहेर पोचले! दार कोणी उघडले म्हणावे तर दाराशी तर कोणीच नव्हते! मग काय दार आपणहूनच बाजूला झाले, मला भ्रम झाला? बाकीच्यांच्याकडे पाहिले तर काही विशेष झाल्याचे कोणाच्याच चेहऱ्यावर दिसत नव्हते. झाला प्रकार इतका विलक्षणं की मी कोणाजवळ बोललेच नाही- झाली गोष्ट मनात ठेवावी व काय होते ते पाहावे असे ठरवले. पुढचे दोन दिवस मी स्वप्नात तर नाही ना असे मला सारखे वाटत होते. मुलांचे डोके आपटणार एवढ्यात भिंती आत वाकत व त्यांना लागण्याचे टळे; बागेत दगडाला ठेचाळणार तो दगड बाजूला होई खुर्च्या, टेबले, पलंग घडवंच्या चटदिशी मागे सरकायच्या नाहीतर अंग चोरायच्या. दोन दिवसात कोणाला काही लागले नाही
{{gap}}मुलांच्या लक्षात येणे काही शक्यच नव्हते, पण त्यांच्या वडिलांना तरी काही दिसले असेल म्हणून मी विचारले, "तुझ्या ध्यानात आलं का गेले दोन दिवस पोरं कुठं धडपडली नाहीत ते? -आश्चर्य आहे, नाही?" वर्तमानपत्रात खुपसलेले डोके काढून तो म्हणतो, "त्यात काय आहे एवढं? तू परवा खूप रागावलीस म्हणून जपून चालत असतील." आता मात्र कमाल आहे ह्या गृहस्थाची! माझ्या रागावण्याने पोरे धडपडायची आणि हा वर्तमानपत्रात डोके घालून बसायचा थांबला तर काय हवे होते? त्याला विचारण्यात अर्थ<noinclude></noinclude>
ff2105ql1mrlpvw0vmnereyk784ldau
पान:Paripurti.pdf/15
104
20837
229995
134073
2026-05-16T07:12:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229995
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="SAMRATH DANDALE" />{{RunningHeader||| परिपूर्ती / १७}}</noinclude>नाही म्हणून मी विचार करू लागले की, घराला व घरातल्या वस्तूंना झाले आहे तरी काय? -घरी कोणी नाहीसे पाहून एकदा सगळ्यांना सांगितलेसुद्धा की, "बाबांनो, तुम्ही मुलांना जपता ते ठीक आहे; पण तुमच्या अशा करण्यानं पोरं दिवसें दिवस जास्तच बेफिकीर राहू लागली आहेत. तुमच्या ह्या-लाडानं त्यांना पुढे पस्तावा करण्याची पाळी येईल." पण काही उपयोग झाला नाही, इतके दिवस बाकीच्या घरांसारखे वागल्यावर इतक्या दिवसांनी एकदस ह्या घराला वेड का लागले? मला आता आठवले. गौरीच्या गुडघ्याला लागले. त्या दिवशी भावजी आले होते. आम्ही चहा घेत असता ताईबाई गाणे गुणगुणत येता-येता हापटल्या. वाटेतल्या स्टुलावर, मी नेहमीप्रमाणे कडाडले. भाऊजींनी उठून ताईला हात धरून-उगी केले व दोन गोष्टी बोलून खेळायला पाठविले आणि- नंतर मला एक व्याख्यान ऐकवले "मुलं म्हणजे कशी फुलांसारखी असतात. असं त्यांना रागावलं म्हणजे त्यांचा व्यक्तिविकास थांबतो व त्यांची मनं खुरटी होतात. तू एवढ़ी शिकलेली पण तुला माँटेसोरीची तत्वं काहीच कशी समजत नाहीत? त्यांना काही लागायच्या आतच आपण त्यांच्यापुढची अडचण काढावी." मी म्हटले, "बाबा रे, घरातल्या सगळ्या वस्तू काढूनसुद्धा भागणार नाही..." "छे! असं बोलू नकोस. अशा बोलण्यानं ती जास्तच धडपडतात व त्यांना न्यूनगंड उत्पन्न होतो." मी भाऊजींशी वाद घातला नाही. ते गेल्यावर थोड्याच वेळाने गौरीला लागले व मी चोप देण्याची धमकी घातली. भाऊजींचे व्याख्यान सबंध घराने तर नाही ना मनावर घेतले? मी एक निःश्वास टाकून कामाला लागले.

{{gap}}मुलांची बेपर्वाई न आंधळेपणा वाढत होता व सर्व घर त्यांच्या मार्गातून बाजूला सारून त्यांचा मनोविकास करीत होते. गौरी न् मी बागेत उभ्या होतो. इतक्यात समोरून आरोळी आली, "गौरी ग धाव, हा बघ मासा कसा करतोय ते!" गौरी फाटक उघडून रस्ता ओलांडायला धावली. नेहमी ती इकडे तिकडे पाहून जायची, पण आज मात्र तिने एकदम रस्त्यात उडी घातली. रस्त्यातून केवढी मोठी लष्करी मोटार भरधाव येत होती. तिचा कर्कश भोंगा वाजला, ब्रेक दाबून चाके खर्रकन रस्त्यावर वाजली व मी धावत जाऊन जवळजवळ गाडीपुढूनच पोरीला ओढून काढले. तिला घट्ट हृदयाशी धरले; ती खूपच भेदरली होती; ओठ पांढरेफटक पडले होते व<noinclude></noinclude>
ou57omf61d05dm73daondr3u6u279o4
पान:Paripurti.pdf/16
104
20838
229996
134074
2026-05-16T07:19:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* Proofread */
229996
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="SAMRATH DANDALE" />{{RunningHeader|१८ / परिपूर्ती}}</noinclude>हृदय पाखरासारखे पिटपिट करीत होते. तिला शांत केली, समोरच्या चंदूकडे पोचवली व मी धावत घराच्या गच्चीवर गेले. मी पण घाबरले होते, घाबरण्यापेक्षाही मला राग आला होता. मी हुंदके देत पण रागानेच घराला व आतील सर्व वस्तूंना सांगितले, 'पाहिलं तुमच्या लाडाचा काय परिणाम झाला तो? सांगितलं नव्हतं मी की, मुलं जास्तच बेफिकीर व निष्काळजी होतील म्हणून? आज तुमच्यामुळे माझी पोरगी हातची जात होती. कसला आला आहे मनोविकास? माझ्या रागावण्यानं ती खुरटतात काय? मूर्ख नाही तर! त्यांची डोकी हापटली तरच शहाणपण येईल, एरवी नाही. आणि जर तुम्ही ह्याउपर ऐकणार नसाल तर साऱ्या मुलांना बोर्डिगात पाठवीन. मग तुम्हाला मुलांचं हसणं, रडणं, भांडणं, बोकाळणं, काही ऐकू यायचं नाहीं, समजलात?" "आई ग!" म्हणून एवढ्यात किंचाळणे ऐकू आले. मी खाली धावले तो नंदोबा रडत होता. डोके दारावर आपटून चांगलेच सुजले होते. थोडक्यात बचावला, नाहीतर डोळाच जायचा. "चल स्वैपाकघरात, हळदीचा ओढा घालते." मी त्याचा हात धरून त्याला नेले.

{{right|{{xx-larger|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
c6h0r5ldedaytxp0h3uq29t3p13ldz0
पान:Paripurti.pdf/18
104
20840
230003
68578
2026-05-16T11:05:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230003
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|20 / परिपूर्ती }}</noinclude>पण आमचे सामान मात्र डोंगराएवढे होते. आमची कामकरी माणसे गेल्या वर्षाच्या अनुभवाने अगदी तरबेज झाली होती. हां हां म्हणता पाच-पंचवीस जणांनी सामान उचलले. काही गाड्यांवर लादले, काही आम्ही हातात घेतले व बंगल्याच्या वाटेने वाळू तुडवीत चालू लागलो.
{{gap}}उत्तर गुजरात म्हणजे एक वाळूचा समुद्रच आहे. जेथे माणसांचा पायरव फारसा नाही अशा जागी थोडेसे वाळलेले गवत व त्याच्या मुळ्या ह्यामुळे वाळू जरा तरी चिकटून कठीण झालेली असते. पण माणसांच्या पायाखालची वाट आली म्हणजे घोट्यापर्यंत पाय भुसभुशीत वाळूत रूततात. महाराष्ट्रातील कठीण काळी माती किंवा डोंगरांवरील काळे कातळ ह्यांवर चालायला सरावलेले आमचे पाय ह्या वाळूत चालायला अगदी नाखुष असायचे. पायाखाली मुळी स्थिर जमीन लागायचीच नाही. दर पाऊल वाळूत बुडालेले वर काढून परत टाकायचे. वहाण पायात असली तर पाऊल वर उचलल्याबरोबर वाळूचे ओघळ खाली वाहायला लागायचे आणि बूट असला तर दरवेळी बुटात वाळू जमायची. थोडा वेळ झाला की, आपला जडजड व्हायचा; नाहीतर बूट काढावा तो आतल्या बाजूने घासून घोट्याची साल गेलेली असायची अर्थात काही दिवसांनी हेही अंगवळणी पडत असे. आणि ह्या वाळूला तर आम्ही रोज शतशः धन्यवाद देत होतो, कारण हिच्याच मायेच्या पांघरुणाखाली जतन झालेली दहा-पंधरा हजार वर्षांपूर्वीच्या मानवांची संस्कृती आम्हाला गेल्या वर्षी सापडली होती. गेल्या वर्षी दगडाची हत्यारे, खाऊन टाकलेल्या प्राण्यांची हाडे व दात अशा कितीतरी वस्तू आम्हाला मिळाल्या होत्या, व यंदा त्या काळातील माणसेही ह्या वाळूखाली पुरलेली आढळतील ह्या आशेने मोठी सामग्री घेऊन आम्ही आलो होतो!
{{gap}}आम्ही बंगल्यावर पोचल्यावर सामानाची लावालाव केली. टिकाव व फावड्याचे दांडे बसवून टिकवांना धार लावण्यासाठी सुतार व लोहारांना बोलावले दुसऱ्या दिवशी सकाळी खणायला कोण पुरुष येणार, मातीची घमेली टाकायला कोणं पोरी येणार, वाळूतून सांस्कृतिक अवशेष निवडून काढायला कोण येणार, वगैरेंची विचारपूस करून यादी केली. आमच्या कामाचे साहित्य बाहेर काढले. प्रत्येकाने खोलीचा एक-एक कोपरा धरून आपली महिनाभर राहावयाची व निजायची जागा मुक्रर केली. एकेला खोलींत चार चारजण (एकेका कोपऱ्यात एक एकजण) होतो. इतके होते तो<noinclude></noinclude>
apbrd4ntg2j1sbulth9sj1b1ihpkcp6
पान:Paripurti.pdf/19
104
20841
230020
68630
2026-05-16T11:16:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230020
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / २१ }}</noinclude>पाणी तापले म्हणून एकेकाने जाऊन आंघोळ उरकली व संध्याकाळच्या जेवणाचीं वाट पाहात सोप्यात खुर्च्या टाकून बसलो. ह्याच सुमारास गावातील चार शिष्ट मंडळी भेटावयास आली- एक मास्तर, एक डॉक्टर, एक व्यापारी व इतर दोन-तीनं मंडळी होती. "तुमच्यासारखी मोठी माणसं आमच्या कुग्रामाला भेट देतात म्हणून आम्हास घन्य वाटतं," वगैरे औपचारिक बोलणी चालली होती. त्यातला एक बराच म्हातारा होता तो म्हणाला, "अहो, कसचं कुग्राम आणेि कसचं शहर घेऊन बसलात! नशीब नेत तशी माणंसं फिरत असतात. ज्याच जिथ अन्नपाणी तिथं तो जातो." दुसरा म्हणाला, हे तर खरच आणि मागल्या जन्मीचे लागेबांधे असल्याशिवाय का तुमच्या-आमच्या गाठभेटी होतात?" श्री. सांकळिया सर्वांशी हसून बोलंत होते, आम्ही बाकीची स्तब्ध बसून अधूनमधून माना डोलवीतं होतो. गेल्या वर्षाची परिचित सृष्टी समोर दिसत होती. सूर्य पिवळ्या लखलखत्या सोनेरी किरणांनी सगळ्या वस्तूंना मुलामा चढवीत होतो. ह्या किरणात आल्हाददायक चमक होती, पण तीव्रता नव्हती आता सगळीकडे शुद्ध बावनकशी सोन्याच्या रंगात झाडांचे शेंडे, घराची छपरे, शेते रंगून निघाली होती. समोरच्या तळ्यावर वाऱ्याच्या झुळकीसरशी सोन्याच्या लहरी पसरत होत्या. हळूहळू ह्या शुद्ध सोन्याला लाली चढू लागली. गिनीची भट्टी तापत होती. "हं! पक्षी घरी यायची वेळ झाली" असे मी मनात म्हणते तोच माझ्या उत्सुक कानांना सारस पक्ष्याचा कर्कश पण आर्त स्वरं ऐकू आला व बंगल्यापुढून एक जोडी तळ्याच्या दिशेने गेली. किती खाली उडत होते ते! त्यांचे लाब, राखी, निळसर पंख ताणून पसरले होते, दोन-अडीच फूट लांब पाय मागे लांबवले होतें, तितकीच लांब गोल मान पुढे लांब चोचीच्या टोकाशी निमुळती झाली होती. मधूनच ते 'कर्र क्रे' असे ओरडायचे वे आपल्या जड लांब पंखांची खालीवर हालचाल करायचे. "विमान चाललंयं जणू!" आमच्यातला एकजण म्हणाला, मी मानेनेच नकार दिला... छे! विमान किती उडालं तरी ह्या जिवंत सौंदर्याची प्रचीती मला कधी आली नाही. विमानाचे सगळे भाग कसे एकमेकांनां घट्ट सांधलेले असतात. त्यांचे लांबलांब पंख कसे कुठच्याही स्थितीत विमानाच्या अंगाशी एकच कोन करूनै ताठ पसरलेले असतात. छेः! ते उडणं निर्जीव असतं, तो एक मानवी बुद्धीचा उत्कर्ष असतो. पण ही पक्ष्यांची जोडी! त्यांचे ताठ लांबवलेले मान-पाय-पंख क्षणक्षणाला स्पंदन पावत<noinclude></noinclude>
k0ftj322yustxcr5ugr758escqgnqv8
पान:Paripurti.pdf/20
104
20842
230034
68639
2026-05-16T11:26:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230034
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| २२ / परिपूर्ती }}</noinclude>असतात व मधेच दोन्ही पंख जडपणे झाप मारतात तेव्हा हा ताठपणा म्हणजे लवचिक जिवंत अवयवांनी इच्छेच्या बळावर धारण केलेले व क्षणिक टिकणारे जड अचल रूप आहे ह्याचा साक्षात्कार होऊन मनात काय आनंदाच्या लाटा पसरतात! ती जोडी मंद घिरट्या मारून तळ्याच्या पाळीला उतरली. उतरताना शरीराचा भार काटकुळ्या पायांवर एकदम पडू नये म्हणून लहान लहान उड्या मारून मग ती स्थिर झाली. नेहमीप्रमाणे "कर्र-कर्र-कर्र" करीत दोघांनी वादविवाद केला व तळ्यात जायचे ठरवल. मग एक-एक पाय उंचावून हळूच तळ्याच्या पाण्यात टाकला. काय नखऱ्याने पावले टाकायची! आपले वस्त्र भिजू नये व पाणी वर उडू नये म्हणून साडी सावरून हळूच पाऊल टाकावे ना, अगदी तसेच. पहिली जोडी पाण्यात शिरते न शिरते तोच इतरही जोड्या "कर्र-क्रे" करीत येऊ लागल्या. त्यात समोरच्या झाडावर मोर "म्यांवो, म्यांवो" म्हणून ओरडू लागले व पक्ष्यांच्या आवाजाने सारे अंतराळ भरून गेले. गेल्या वर्षी लांघणज सोडले तेव्हापासूनचा मधला काळ जणू नाहीसा होऊन, कालच्या पुढचा नवा दिवस मी अनुभवीत होते. असा आमचा छावणीवरील जीवनक्रम सुरू झाला.
{{gap}}दुसऱ्या दिवशी सकाळी आठाच्या आत जेवणे उरकून आम्ही व आमची कामकरी मंडळी खणतीच्या जागी निघालो, व सर्वांनी मिळून खपून दुपारच्या मधल्या सुटीपर्यंत यंदाचे खणायचे क्षेत्र आखून, खुंट्या ठोकून निश्चित केले. एक तास विश्रांती घेऊन परत कामाला सुरुवात झाली. म्हातारा हिरोजी सर्वांत वडील, त्याच्याजवळ टिकाव दिला व देवाचे नाव घेऊन पहिला घाव मारावयास सांगितला. त्यानेही "जै मा-देवजी" म्हणून पाहिले डिखळ घाव मारून काढले. सोळा फूट लांब व सहा फूट रुंद अशा चार फूट अंतरवरच्या दोन क्षेत्रात एकदम सुरुवात केली. एका खड्डयावर मी काम पाहत होते, दुसऱ्यावर आमचे प्रमुख होते. दिवस संपता संपता थोडीथोडी दगडाची हत्यारे सापडू लागली. दुसऱ्या दिवशी परत काम सुरू झाले. गेल्या वर्षीप्रमाणेच खूप अवशेष सापडत होते, व आम्ही सारखे त्यांची नोंद करीत होतो. पण माणसाचे अवशेष काही मिळाले नाहीत. पहिला खड्डा खूप खोल गेला. सांस्कृतिक अवशेष संपले म्हणून तो टाकून नव्या खड्ड्याला सुरुवात केली. एक दिवस माझ्या खड्ड्यात उभी असताना मला माझ्या नावाने जोरजोराने हाक ऐकू आल्या. वर आले तो माझे सहकारी जवळजवळ धावतच येऊन म्हणाले, "चला, चला लवकर; माणसाची कवटी सापडली<noinclude></noinclude>
jjvi1c7w10nbguf2jvwsyw42llpfw3w
पान:Paripurti.pdf/21
104
20843
230038
68640
2026-05-16T11:30:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230038
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / २३ }}</noinclude>आहे." मीही उल्हासाने पुढे झाले, व नव्या खड्ड्यात उतरून पाहिले तो पिवळसर, गोल असे काहीसे मातीतून बाहेर डोकावत होते. सर्व कामकऱ्यांना दूर सारून लहान सुरी व दाभण ह्यांचे साह्याने माती हळूहळू उकरली व तो पदार्थ मोकळा केला; तो काय, एक मोठा गुळगुळीत गोटा आढळला! आमची निराशा हसण्याखाली लपवून काम पुढे चालू केले. थोड्या वेळाने मला परत बोलावणे आले. "काय उगीच दगड उकरायला बोलावता कोण जाणे!" असे पुटपुटत मी वर आले तो माझे सहकारी वर खड्ड्याच्या काठाशी पुढ्यात एक मोठे ढेकूळ घेऊन बसलेले दिसले. "पाहा पाहा, आम्ही काय काढलं आहे ते! ह्या वेळेला गोटा म्हणून काढला तो कवटीच निघाली!" मी पाहिले तो खरेच त्या मातीच्या डिखळात रुतलेली ती एक कवटी होती. मी ती पुढ्यात घेऊन सुरी-दाभण-कुंचले ह्यांच्या साह्याने साफ करू लागले, व बाकीची मंडळी माझ्याभोवती गोळा झाली. छावणीत प्रत्येकाची कामे ठरलेली होती. चित्रकार व भूपर्यवेक्षक खड्डयाचे, अवशेषांचे फोटो व चित्रे काढीत आणि नकाशे तयार करीत. आमचे मुख्य सर्वांवर देखरेख करीत, पण मुख्यत्वेकरून ते प्रागैतिहासिक काळातील दगडाच्या हत्यारांचे एक निष्णात संशोधक होते. मी मनुष्याच्या कवट्या व हाडे ह्यांचा मुख्यत्वे अभ्यास केलेली होते. म्हणून माणसाचे हाड दिसले की, माझ्या ताब्यात द्यावयाचे असे ठरलेले होते. एकीकडे. मी कवटी साफ करीत होते व एकीकडे तोंडाने माझ्या सहकाऱ्यांना कवटीचे विशेष सांगत होते. "ही पाहिलीत ना मातीच्या दाबानं कवटीची कशी चिपटी झाली आहे? कवटीच्या निरनिराळ्या हाडांच्या शिवणी उसवून मधेमधे फटी पडल्या आहेत." कवटी एका म्हाताऱ्याची होती. दात जिवंतपणीच पडून हिरड्या बुजल्या होत्या. खालची हनुवटी दात जाऊन व हिरड्या झिजून अरुंद झाली होती. दुर्दैवाने म्हाताऱ्याच्या इतर हाडांचे अवशेष फारसे सापडले नाहीत. आता ह्यापुढे स्वच्छ करून फोटो काढावे म्हणजे जास्त बरे असे ठरले. म्हाताऱ्याच्या पाठोपाठच थोड्या अंतरावर एक सबंधच सांगाडा सापडला. त्या माणसाचे हात छातीवर एकमेकांवर ठेवलेले होते. उजव्या हाताचा पंजा डाव्या कोपरावर व डाव्याचा उजव्या कोपरावर होता. पाय मुडपून ठेवलेले होते. पण सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे चेहऱ्याच्या डाव्या बाजूला कपाळापासून तो हनुवटीपर्यंत साफ घाव बसून केवढी फट पडली होती! हाड अगदी कापले गेले होते, व इतक्या सहस्रकांच्या अवधीनंतरही<noinclude></noinclude>
9t1tf2hjwzfto0jxzltp3fi4p8ptx9b
पान:Paripurti.pdf/22
104
20844
230040
69884
2026-05-16T11:39:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230040
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| २४ / परिपूर्ती}}</noinclude>पाहणाऱ्यांच्या हृदयात भीतीची चमक उठत होती. माणूस अगदी तरणाबांड पुरुष होता जेमतेम २५-३० वर्षांचा असेल नसेल. कामकरीसुद्धा स्तब्ध होते. शेवटी म्हातारा हिरोज़ी म्हणाला, "बाई, हा माणूस लढाईत मेलेला असणार." त्याच्या शब्दाबरोबर सगळ्यांना वाचा फुटली. आमच्या साहेबांचा तरुण मदतनीस म्हणाला, "हो हो, हा जवान लढाईत मेला, आणि त्याच्या दुःखानं त्याचा म्हातारा बाप मेला." माझी व सांकळियांची दृष्टाष्ट झाली, व आम्हाला दोघांनाही हसू लोटले.
{{gap}}दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशीच्या सांगाड्यापलीकड़े पाच-सहा हातांवर एक कुत्रे पुरलेले आढळले. "कुत्रं कसं बुवा मेलं?" मंडळी विचारीत होती. पण त्या कुत्र्यामुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली होती. कुत्रा काही आपोआप मेलेला नव्हता. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याला ठार मारला होता. "ह्या जुन्या वसाहतीत एक, माणूस- बहुधा पुरुष... मेला असला पाहिजे, व त्याला पुरताना त्याचे नोकरचाकर, हत्यारे, त्याचा विश्वासू कुत्रा, सगळ्यांना मारून पुरले असले पाहिजे" असा मी उलगडा गेला, तो सगळ्यांना पटला व काम दुप्पट उत्साहाने सुरू झाले.
{{gap}}गेल्या वर्षी आम्हाला कितीतरी अवशेष सापडले होते, पण त्यान माझ्या मनाला असा चटका लागला नव्हता. यंदा मात्र गतकालाती जीवनाच्या ह्या अदभुत आविष्काराने माझे मन भारावल्यासारखे झाले होते. माझे शरीर व मनाचा एक भाग सगळ्यांच्याबरोबर काम करीत होता.
{{gap}}माझ्या ताब्यात आलेले सांगाडे नीट उकरून, मातीसकट वर उचलून, मेणवून, त्यांना कापडाच्या लांब लांब पट्यांनी घट्ट बांधून, कापसात गुंडाळून, ट्रंकेत ठेवणे वगैरे कामे मदतनीसांच्या साहाय्याने चालली होती. पण मन मात्र मुळीच ठिकाणावर नव्हते. हिवाळ्याच्या दिवसात दाट धुक्यातून पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करावा, धुके क्षणमात्र विरळ होऊन पलीकडे काहीतरी ओळखीचे दिसल्याचा भास होऊन ती वस्तू परत धुक्यात गुरफटून जावी तसे मला झाले होते. मी टेकाडावर उभी राहून एकदा चहूकडे नजर टाकली. वाळूचा दर्या अनंत पसरला होता. खाली तळे एखाद्या आरशासारखे नितळ पसरले होते. त्यावर लहानशीसुद्धा लाटेची सुरकुती नव्हती. समुद्र कधीच असा नितळ नसतो, कितीही शांत असला तरी लाटांच्या लहानलहान टेकड्या त्यावर असायच्याच, तसेच अगदी लहान लहान उंचवटे ह्या वाळूच्या समुद्रावर वाऱ्याच्या दिशेने पसरलेले होते. पण ते<noinclude></noinclude>
ji5d6uq6s3iztk0i31ngdx4527b00bv
पान:Paripurti.pdf/23
104
20845
230041
69890
2026-05-16T11:47:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230041
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / २५ }}</noinclude>काही पाण्यातल्या लाटासारखे अव्याहते खालीवर हलत नव्हते. ह्या लाटा जणू थिजल्या होत्या. मी त्या लाटांच्या एका उंचवट्यावर उभी होते दोन्ही बाजूला उथळ खोलगट भाग होता; व त्यापलीकडे दुसऱ्या लाटांचे उंचवटे दिसत होते. क्षितिजापर्यंत अशा वाळूच्या लाटा पसरल्या होत्या. दहा-पंधरा हजार वर्षापूर्वीही त्या अशाच असणार हे टेकाड असेच पण जरा ठेंगणे असणार. आत्ता त्यावर गेल्या पंधरा सहस्रकांच्या वाळूचे थर साचले आहेत. त्यावेळी ही रानटी माणसे येथे वस्ती करून होती. अशाच तळ्याचे पाणी पीत होती. आणि.. आणि..? धुके क्षणभर बाजूला झाले होते. अज्ञातांच्या पलीकडे ओळखीचा चेहरा दिसल्यासारखा वाटला पण परत सर्व-धुक्यात बुडून गेले. सबंध दिवस असाच गेला. रात्री निजले तीही विमनस्क अवस्थेत... मन व शरीर कशी श्रांत झाल्यासारखी झाली होती.
{{gap}}मी ताडकन उठले कसला तरी मोठा कोलाहल चालला होता. माझ्या नावाने हाका ऐकू येत होत्या. कसल्या तरी भीतीने मी थिजल्यासारखी झाले होते. पण कोलाहल वाढला. छेः! मला गेलेच पाहिजे. मी चालत जाऊन दाराच्या कडीला हात घातला. इतक्यात विजेच्या दिव्याचा झोत माझ्या अंगावर पडला, व "कोण आहे?" असा माझ्या सहकाऱ्याचा परिचित आवाज कानावर पडून मी जागी झाले. माझे पाय लटपटत होते, तोंडाला कोरड पडली होती. "मी आहे. जरा बाहेर जाऊन येते," असे उत्तर देऊन मी खोली बाहेर सोप्यात आले थंडीच्या कडाक्यात माझे अंग शहारले. बाहेर ठेवलेल्या माठातील बर्फासारखे गार पाणी मी घोटभर प्याले. पाणी इतके गार होते की, पाण्याचा घोट तोंडातून पोटापर्यंत पोचला ती सबंध वाट जणू बर्फाने कापीत कापीत गेल्यासारखे वाटले, पण त्यामुळे माझी झोप पार उडाली. मी शुद्धीवर आले. अंधारी रात्र होती. उत्तर गुजरातची कडक थंडी पडली होती. स्वच्छ गडद आकाशात तारे चमकत होते व सर्व सृष्टी अगदी निस्तब्ध शांत होती. मी डोळ्यांवरून हात फिरवला; एक निश्वास टाकला. खूप रडल्यावर घसा दुखावा, छाती जड वाटावी, तसे मला वाटले. पण मी का उठले? मला कसले स्वप्न पडत होते? काही आठवेना. मी परत आत गेले व माझ्या कोपऱ्यात जाऊन निजले
{{gap}}ह्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्हाला 'ती' सापडली. पहिल्याने तंगडीचे हाड मोकळे झाले, ह्यामुळे माणूस असल्याचा सुगावा लागून कामकऱ्यांना दूर सारले, व आम्ही लहान-लहान हत्यारांनी सावकाशपणे<noinclude></noinclude>
6jw0fgschpj9oc600l9tufy8mnk7b9m
पान:Paripurti.pdf/24
104
20846
230042
69900
2026-05-16T11:57:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
230042
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| २६ / परिपूर्ती }}</noinclude>हाडांच्या अनुरोधाने माती उकरून संबंध सांगाडा मोकळा केला. पायाचा हाडे उघडी पडल्यापासूनच मला शंका आली होती. संबंध सांगाडा दिसू लागल्याबरोबर तर शंका फिटली. "कुत्रा पाहिल्यापासून बाईचा सांगाडा मिळणार म्हणून वाटतच होतं... हा घ्या मिळाला!"—- मी म्हटले. "म्हणजे? हिलाही मारून टाकली काय?" माझ्या विद्यार्थ्याने प्रश्न केला. ह्यात काय संशय? स्वर्गात जसे नोकरचाकर व इमानी कुत्रा लागतो तशा बायको नको का?" त्याच्या प्रश्नाला सांकळियांनी उत्तर दिले. "पण ही बाईच कशावरून?" माझ्याकडे वळून त्यांनी विचारले आणि मी त्यांना व इतरांना सांगाड्याची कमरेची हाडे, हाडाचा हलकेपणा, डोक्याच्या काही विशिष्ट हाडांच्या खुणा यांची माहिती देऊ लागले. हे व्याख्यान संपल्यावर सर्व मंडळी उठली. "हे पहा, सांगाडा आता तुमच्या ताब्यात देतो- तुम्ही फोटोसाठी नीट साफ करून ठेवा. अजून ऊन फार आहे, दोन तासांनी सूर्य मावळायला आला म्हणजे नीट बेताचा प्रकाश पडेल तेव्हा फोटो घेऊ. आम्ही पलीकडे काम सुरू करतो. तुम्हाला कोणी मदतनीस पाहिजे का?" श्री. सांकळिया म्हणाले. मी मानेनेच नकार दिला व सर्व मंडळी निघून गेली. मी एकटीच त्या खड्ड्यात राहिले. वरून ऊन रणरण तापत होत. मी वाकून हलक्या हाताने, सांगाडा न चाळवता, हाड न हाड दाभण, चाकू व कुंचला ह्यांच्या साह्याने साफ करीत होते. पंधरा हजार वर्षांनी मातीच्या पांघरूणातून बाहेर पडून त्यांना सूर्यदर्शन होत होते. बाई पुरुषाप्रमाणेच पाय मुडपून, हात छातीवर ठेवून व डोके कुशीला वळवून पुरलेली होती; पण पुरुषाचा देह केवढा दिसत होता आणि हिच्या हाडाची जुडी केवढ्याशा लहान जागेत मावली होती! शरीराची हाडे साफ करून माझे हात डोक्याकडे वळले. केवढे लहानसे डोके होते! घडणही मोठी नाजूक वाटली. तिच्या गुळगुळीत कवटीवर माझी बोटे फिरत होती व मन यंत्राप्रमाणे नोंद करीत होते; "डोक्याचा मागचा भाग बराच फुगीर आहे बरं का- आणि हे कपाळ जरा अरुदच आहे." माझा दाभण डोळ्याच्या खाचेतून माती उकरू लागला, डोळ्याची खाच साफ झाली; "ही नाकाची हाडं, त्याखालील भोकं रुंद दिसत आहेत. नाक बसकं न रुंद होतं वाटतं. गालफडाची हाड लहानच आहेत." माझे हात जबड्यापाशी पोचले. हाडांचा रंग पिवळसर-काळसर मातीच्या रंगासारखाच होता. पण जबड्यावरून ब्रश फिरताच दात उघडे पडून उन्हात चकाकले. माझे हृदय धडधडत होते. जवळच्या खड्ड्यात आणि<noinclude></noinclude>
49mrmt9r5mtfms5rcxr4daj8lbrm1r5
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४८
104
85702
229983
181868
2026-05-16T03:59:13Z
JayashreeVI
4058
229983
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४३}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जो निर्मळास ध्यायील । तो निर्मळाचे होईल ।
जो जयास भजेल | तो तद्रूप जाणावा ||</poem>}}
{{gap}}तिसरा समास व्यावहारिक उपदेशपर आहे. येथें नरदेहाचें महत्व
सांगितले असून मनुष्यानें व्यवहारांत कसे वागावें हें दाखविले आहे.
{{block center|<poem>बहुतां जन्माचा शेवट । नरदेह सांपडे अवचट ।
येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ||
प्रपंच करावा नेमक | पहावा परमार्थ विवेक ।
जेणें करितां उभय लोक । संतुष्ट होती ॥
तरी आतां ऐसें न करावें | बहुत विवेकें वर्तावें ।
इहलोक परत्र साधावे । दोहींकडे ॥
आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे ।
सुख म्हणोन आवडे । आळसी लोकां ।।
साक्षेप करितां कटती । परंतु पुढे सुरवाडती ।
खाती जेवती सुखी होती । यत्नेंकरूनी ॥
आळस उदास नागवणा | आळस प्रयत्न बुडवणा ।
'आळसें करंटपणाच्या खुणा । प्रकट होती ॥
म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा ।
अरत्रीं परत्रीं जीवा | समाधान ||</poem>}}
{{gap}}चवथ्या समासांत पुनः नेहमीच्या वेदांती पालुपदावर रामदास आले आहेत. पण शेवटीं तिसऱ्या समासाप्रमाणें विवेकानें वागण्याचा उपदेश केला आहे.

{{gap}}पांचव्या व सहाव्या समासांत पुन्हां राजकारण हा शब्द आला आहे व राजकारण करणें हे मनुष्याच्या कर्तव्यापैकी एक कर्तव्य आहे असे म्हटले आहे व राजकारण करतांना कसे वागले पाहिजे कोणते धोरण स्वीकारलें पाहिजे याचें विवरण केले आहे. म्हणून हे दोन्ही समास बहुतेक जसेच्या तसे येथे उतरून घेणे इष्ट आहे.
{{block center|<poem>एक हरिकथा निरूपण | दुसरें तें राजकारण |
तिसरें तें सावधपण । सर्व विषयीं ॥</poem>}}<noinclude></noinclude>
5rhbv6vc0im2d0fngssac6qtgu9pd16
229984
229983
2026-05-16T03:59:48Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229984
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४३}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जो निर्मळास ध्यायील । तो निर्मळाचे होईल ।
जो जयास भजेल | तो तद्रूप जाणावा ||</poem>}}
{{gap}}तिसरा समास व्यावहारिक उपदेशपर आहे. येथें नरदेहाचें महत्व
सांगितले असून मनुष्यानें व्यवहारांत कसे वागावें हें दाखविले आहे.
{{block center|<poem>बहुतां जन्माचा शेवट । नरदेह सांपडे अवचट ।
येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें ||
प्रपंच करावा नेमक | पहावा परमार्थ विवेक ।
जेणें करितां उभय लोक । संतुष्ट होती ॥
तरी आतां ऐसें न करावें | बहुत विवेकें वर्तावें ।
इहलोक परत्र साधावे । दोहींकडे ॥
आळसाचें फळ रोकडें । जांभया देऊन निद्रा पडे ।
सुख म्हणोन आवडे । आळसी लोकां ।।
साक्षेप करितां कटती । परंतु पुढे सुरवाडती ।
खाती जेवती सुखी होती । यत्नेंकरूनी ॥
आळस उदास नागवणा | आळस प्रयत्न बुडवणा ।
'आळसें करंटपणाच्या खुणा । प्रकट होती ॥
म्हणोन आळस नसावा । तरीच पाविजे वैभवा ।
अरत्रीं परत्रीं जीवा | समाधान ||</poem>}}
{{gap}}चवथ्या समासांत पुनः नेहमीच्या वेदांती पालुपदावर रामदास आले आहेत. पण शेवटीं तिसऱ्या समासाप्रमाणें विवेकानें वागण्याचा उपदेश केला आहे.

{{gap}}पांचव्या व सहाव्या समासांत पुन्हां राजकारण हा शब्द आला आहे व राजकारण करणें हे मनुष्याच्या कर्तव्यापैकी एक कर्तव्य आहे असे म्हटले आहे व राजकारण करतांना कसे वागले पाहिजे कोणते धोरण स्वीकारलें पाहिजे याचें विवरण केले आहे. म्हणून हे दोन्ही समास बहुतेक जसेच्या तसे येथे उतरून घेणे इष्ट आहे.
{{block center|<poem>एक हरिकथा निरूपण | दुसरें तें राजकारण |
तिसरें तें सावधपण । सर्व विषयीं ॥</poem>}}<noinclude></noinclude>
6o3xsq81busq9kzl2zo4a8ktuz9qe2o
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/४९
104
85703
229985
181869
2026-05-16T04:10:30Z
JayashreeVI
4058
229985
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|४४|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप ।
अन्याय थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥
जाणावें पराचें अंतर । उदासीनता निरंतर ।
नीति न्यायास अंतर । पडोंच न द्यावें ॥
संकेतें लोक वेधावा । एकून एक बोधावा ।
प्रपंचहि सांवरावा । यथानुशक्त्या ||
प्रसंगसमय वोळखावा । धीर बहुत असावा ।
संबंध पडो न द्यावा । अति परिचयाचा ॥
उपाधीस विस्तारावें । उपाधत न सांपडावें ।
नीचत्व पहिले घ्यावें । आणि मूर्खपण ||
दोष देखोन झांकावे | अवगुण अखंड न बोलावे ।
दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी ॥
तऱ्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाय |
नव्हे तेंचि करावें कार्य । दीर्घ प्रयत्नें ।।
फड नासोंच न द्यावा । पडिला प्रसंग सांवरावा ।
अतिवाद न करावा । कोणी एकासी ॥
दुसऱ्याचें अभीष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें ।
न सोसे तरी जावें । दिगंतरासी ॥
दुःख दुसऱ्याचें जाणावें । ऐकोन तरी वाटोन ध्यावें ।
बरें वाईट सोसावें | समुदायाचें ॥
अपार असावें पाठांतर । सन्निध असावा विचार ।
सर्वदा सर्वतत्पर । परोपकारासी ॥
शांति धरून धरवावी । तऱ्हे सांडून सांडवावी ।
क्रिया करून करवावी । बहुतां करवीं ॥
करणे असला उपाय । तरी बोलोन दाखऊं नये ।
परस्परेंचि प्रत्यय । प्रचीतीस आणावा ॥.
जो बहुतांचें सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना ।
बहुत सोसितां उरेना । महत्त्व आपुलें ॥</poem>}}<noinclude></noinclude>
dl2si00829aaqq0tf8o7kwwnpfcaznr
229986
229985
2026-05-16T04:10:59Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229986
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|४४|सज्जनगड व समर्थ रामदास.}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>चौथा अत्यंत साक्षेप । फेडावे नाना आक्षेप ।
अन्याय थोर अथवा अल्प । क्षमा करीत जावे ॥
जाणावें पराचें अंतर । उदासीनता निरंतर ।
नीति न्यायास अंतर । पडोंच न द्यावें ॥
संकेतें लोक वेधावा । एकून एक बोधावा ।
प्रपंचहि सांवरावा । यथानुशक्त्या ||
प्रसंगसमय वोळखावा । धीर बहुत असावा ।
संबंध पडो न द्यावा । अति परिचयाचा ॥
उपाधीस विस्तारावें । उपाधत न सांपडावें ।
नीचत्व पहिले घ्यावें । आणि मूर्खपण ||
दोष देखोन झांकावे | अवगुण अखंड न बोलावे ।
दुर्जन सांपडोन सोडावे । परोपकार करूनी ॥
तऱ्हे भरोंच नये । सुचावे नाना उपाय |
नव्हे तेंचि करावें कार्य । दीर्घ प्रयत्नें ।।
फड नासोंच न द्यावा । पडिला प्रसंग सांवरावा ।
अतिवाद न करावा । कोणी एकासी ॥
दुसऱ्याचें अभीष्ट जाणावें । बहुतांचें बहुत सोसावें ।
न सोसे तरी जावें । दिगंतरासी ॥
दुःख दुसऱ्याचें जाणावें । ऐकोन तरी वाटोन ध्यावें ।
बरें वाईट सोसावें | समुदायाचें ॥
अपार असावें पाठांतर । सन्निध असावा विचार ।
सर्वदा सर्वतत्पर । परोपकारासी ॥
शांति धरून धरवावी । तऱ्हे सांडून सांडवावी ।
क्रिया करून करवावी । बहुतां करवीं ॥
करणे असला उपाय । तरी बोलोन दाखऊं नये ।
परस्परेंचि प्रत्यय । प्रचीतीस आणावा ॥.
जो बहुतांचें सोसीना । त्यास बहुत लोक मिळेना ।
बहुत सोसितां उरेना । महत्त्व आपुलें ॥</poem>}}<noinclude></noinclude>
4286kcwnerpjikf25drjrvdjoqx6fzv
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/५०
104
85704
229987
181870
2026-05-16T04:18:07Z
JayashreeVI
4058
229987
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४५}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem}}राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच न द्यावें ।
परपीडेवरी नसावें । अंतःकरण ।।
लोक पारखून सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे ।
पुनः मेळवूनि घ्यावे । दुरिल्या दोरें ।।
हिरवटास दूरी धरावें । कचरटासि न बोलावें |
संबंध पडतां सांडूनि जावें । एकीकडे ।
ऐसें असे राजकारण | सांगतां तें असाधारण |
सुचित असतां अंतःकरण | राजकारण जाणिजे ॥
वृक्षारूढास उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें |
कारभाराचें सांगावें | अंग कैसें म्हणोनि ||
पाहतां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना ।
आलें वैभव अभिलापिना । कांहीं केल्या ||
एकाची पाठी राखणें । एकास देखों न शकणें ।
ऐसी नव्हत की लक्षणें । चातुर्याची ।।
न्यायें बोलतांहि मानेना। हित तेंचि नये मना ।
येथें कांहींच चालेना । त्यागाविण ॥
शुद्ध नेटकें ल्याहावें । लिहोनि शुद्ध शोधावें ।
शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ।।
विस्कळित मातृका नेमस्त कराव्या ।
धाष्टर्य जाणोनि सदृढ धराव्या ।
रंग राखोन भराव्या | नानाकथा ||
जाणावयाचें सांगतां नये । सांगायाचें नेमस्त नये ।
समजल्याविण कांहींच नये । कोणी एक ॥
हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण |
वर्तायाचें लक्षण । तेंहि असावें ।।
पुसों जाणें सांगों जाणे । अर्थांतर करूं जाणे ।
सकळिकांचें राखों जाणें । समाधान ||</poem>}}
४५<noinclude></noinclude>
4mm20zahswck73370z183c3wx69xodf
229988
229987
2026-05-16T04:19:17Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
229988
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|४५}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>}}राजकारण बहुत करावें । परंतु कळोंच न द्यावें ।
परपीडेवरी नसावें । अंतःकरण ।।
लोक पारखून सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे ।
पुनः मेळवूनि घ्यावे । दुरिल्या दोरें ।।
हिरवटास दूरी धरावें । कचरटासि न बोलावें |
संबंध पडतां सांडूनि जावें । एकीकडे ।
ऐसें असे राजकारण | सांगतां तें असाधारण |
सुचित असतां अंतःकरण | राजकारण जाणिजे ॥
वृक्षारूढास उचलावें । युद्धकर्त्यास ढकलून द्यावें |
कारभाराचें सांगावें | अंग कैसें म्हणोनि ||
पाहतां तरी सांपडेना । कीर्ति करूं तरी राहेना ।
आलें वैभव अभिलापिना । कांहीं केल्या ||
एकाची पाठी राखणें । एकास देखों न शकणें ।
ऐसी नव्हत की लक्षणें । चातुर्याची ।।
न्यायें बोलतांहि मानेना। हित तेंचि नये मना ।
येथें कांहींच चालेना । त्यागाविण ॥
शुद्ध नेटकें ल्याहावें । लिहोनि शुद्ध शोधावें ।
शोधून शुद्ध वाचावें । चुकों नये ।।
विस्कळित मातृका नेमस्त कराव्या ।
धाष्टर्य जाणोनि सदृढ धराव्या ।
रंग राखोन भराव्या | नानाकथा ||
जाणावयाचें सांगतां नये । सांगायाचें नेमस्त नये ।
समजल्याविण कांहींच नये । कोणी एक ॥
हरिकथा निरूपण । नेमस्तपणें राजकारण |
वर्तायाचें लक्षण । तेंहि असावें ।।
पुसों जाणें सांगों जाणे । अर्थांतर करूं जाणे ।
सकळिकांचें राखों जाणें । समाधान ||</poem>}}<noinclude></noinclude>
mq8nmmw17rgniakfpojchodpl1aijpc
अनुक्रमणिका चर्चा:तीन तत्वज्ञानी.pdf
107
110127
230039
229623
2026-05-16T11:31:18Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* duplicate book? */ Reply
230039
wikitext
text/x-wiki
== duplicate book? ==
@[[सदस्य:QueerEcofeminist|QueerEcofeminist]] Looks like this is a duplicate copy of
<nowiki>https://mr.wikisource.org/wiki/अनुक्रमणिका:तीन_तत्त्वज्ञानी.pdf</nowiki>
Please check and advice. [[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]] ([[सदस्य चर्चा:कल्पनाशक्ती|चर्चा]]) ११:४४, १४ एप्रिल २०२६ (IST)
:शीर्षक नीट न दिल्याने एकच पुस्तक दोनदा अपलोड केले आहे. या प्रतीतला दुरुस्त केलेला मजकूर [[अनुक्रमणिका:तीन तत्त्वज्ञानी.pdf]] यातील पानांवर हलवणे योग्य होईल असे वाटते. केलेले काम वाया जाऊ नये. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १७:५४, १७ एप्रिल २०२६ (IST)
::@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]], @[[सदस्य:कल्पनाशक्ती|कल्पनाशक्ती]] म्हणजे प्रत्येक झालेल्या कामाची पाने नवीन ठिकाणी हलवावी लागतील? हरकत नाही. [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] १९:४३, २७ एप्रिल २०२६ (IST)
:::नमस्कार. मी सर्व मजकूर [[अनुक्रमणिका:तीन तत्त्वज्ञानी.pdf]] यातील पानांवर हलवला आहे. सबब हे अनुक्रमणिका पान व यातील सर्व पाने वगळावीत ही विनंती. जेणेकरून भविष्यात संपादकांचा गोंधळ होणार नाही. धन्यवाद! [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १७:०१, १६ मे २०२६ (IST)
slo72zizdaxqdjo3dbjnzfhb7hw2cfw
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८६
104
110337
229997
2026-05-16T10:56:59Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{center|{{xx-larger|'''कँट.'''}}}}
{{center|(१)}}
{{center|{{x-larger|जीवन-वृत्तांत.}}}}
{{gap}}मथळ्यांतील नांव वाचतांच माझे वाचक म्हणतील " हे लेखक लागले आपल्या आवडत्या तत्वज्ञान्याच्या गोष्टी बोलायला ! कँट मोठा तत्त्व..."
229997
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''कँट.'''}}}}

{{center|(१)}}

{{center|{{x-larger|जीवन-वृत्तांत.}}}}

{{gap}}मथळ्यांतील नांव वाचतांच माझे वाचक म्हणतील " हे लेखक लागले आपल्या आवडत्या तत्वज्ञान्याच्या गोष्टी बोलायला ! कँट मोठा तत्त्वज्ञानी असेल, पण त्याचे काय आम्हांला ! मराठीतील आध्यात्मिक वाङ्मयाला कंटाळून तर आम्ही अर्वाचीन ललितवाङ्मय करमणुकीकरितां व विश्रांतीकरितां वाचायला घेतो. तो येथेहे आमच्या पाठीस अध्यात्मविद्या आहेच ! त्यांतल्या त्यांत आम्ही असेंहि ऐकिले आहे की, कँटचे तत्त्वज्ञान तर फार खोल, फार गूढ आणि अत्यंत दुर्बोध आहे. ज्यांची जन्मभाषा जर्मन, अशा लोकांना सुद्धा कँटचे ग्रंथ समजत नाहीत, ते समजण्यास त्यांना इंग्रजी व फ्रेव भाषेतील भाषांतरांची मदत घ्यावी लागते. तेव्हां असलें गूढ, दुर्बोध व कठीण तत्वज्ञान आम्हाला कशाला ?"

{{gap}}यावर माझे असे म्हणणे आहे की, कॅट हे नांव ऐकल्याबरोबर माझ्या प्रिय वाचकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गुलाब म्हटल्याबरोबर गुलाबाच्या झाडाच्या कांट्यांचीच अठवण कां करावी? गुलाबाच्या फुलाची आठवण केल्यास व त्या गुलाबाचा सुवास, त्याच्या पानांची सुकुमारता, त्याचा मोहक रंग, यांचा विचार मनांत आणल्यास मनाला आल्हादच होईल. तसेच या विषयासंबंधीहि होईल अशी मी वाचकांची खातरजमा करतो. कारण, मी या लेखांत कँटच्या तत्त्वज्ञानाचे फारस विवेचन करणार नाही; केले तरी कँटच्या तत्वज्ञानरूपी डोहांत मी वाच-<noinclude>{{center|८०}}</noinclude>
6xwhxnmq34ccxjhajgu5l5d4ma0kpbx
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८७
104
110338
229998
2026-05-16T10:59:29Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कांना बुडवू इच्छित नाही. फार तर पाऊलभर पाण्यांत वाचकांना नेऊन तेथून मी त्यांना कोरडया जागेवर आणून सोडीन. या लेखात मला कँटचे मुख्यत: चरित्र सांगावयाचे आहे. आणि जितके कॅटचे तत्वज्ञ..."
229998
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>कांना बुडवू इच्छित नाही. फार तर पाऊलभर पाण्यांत वाचकांना नेऊन तेथून मी त्यांना कोरडया जागेवर आणून सोडीन. या लेखात मला कँटचे मुख्यत: चरित्र सांगावयाचे आहे. आणि जितके कॅटचे तत्वज्ञान नीरस, गूढ व दुर्बोध आहे, तितकेच त्याचे चरित्र सरस, साधे व सुगम आहे, असे आपल्यास आढळून आल्याखेरीज रहाणार नाहीं.

{{gap}}ज्याप्रमाणे अथेन्सचे नांव काढल्या बरोबर सॉक्रटिसाची आठवण होते. कारण अथेन्स व साँक्रटिस यांमध्ये एक प्रकारची व्याप्ति आहे-सॉक्रेटिसाचे सर्व आयुष्य या एका शहरांतच गेले, त्याचप्रमाणे कँट व कानिग्सबर्ज यांचीहि व्याप्ति आहे. मात्र अथेन्स शहर हे सॉक्रेटिसाच्या आधींपासून जगद्विख्यात शहर होते. परंतु कानिग्सबर्जची तशी स्थिति नव्हती. कँटच्या पूर्वी हे जर्मनींतील विद्यापीठ अगदी अज्ञात, मागसलेले आणि एका कोनाकोपऱ्यांतले होते; परंतु कँटच्यामुळे त्याला सरस्वती मंदिराची पदवी आली व ज्याप्रमाणे एखाद्या पुण्यक्षेत्री भाविकांची यात्रा भरावी. त्याप्रमाणे कॅट या तत्ववेत्त्याला पाहण्याकरतां युरोपांतील हजारों विद्याभक्त आणि विद्याभाविक लोक त्या ठिकाणी येऊ लागले.

{{gap}}कानिग्सबर्ज या गांवीं कॅटचा जन्म १७२४ च्या एप्रिल महिन्यांत झाला. कॅटच्या बापाचा कातड्याच्या वाद्या करण्याचा धंदा होता. त्याची घरची स्थिति फार गरीबीची होती, तरी पण तो मोठा बाणेदार मनुष्य होता. व त्याला आपल्या मतांचा मोठा अभिमान असे. क्रिश्चन धर्मोतील एक पोटभेद भक्तिपथ म्हणून निघाला होता, त्याचा तो अनुयायी होता व या आपल्या मताकरतां तो लोकच्छल सोसण्यासही तयार असे. कँटची आईहि फारच भाविक असे व कॅटच्या मनावर तिच्या भक्तिपंथी शिक्षणाचा फार ठसा उमटला होता. कॅट आपल्या उतारवयांत सुद्धां आपल्या आईबद्दल मोठया प्रेमाने आणि आदराने बोलत असे. कॅटचे सर्व शिक्षण या गांवांतच झाले. कँटच्या तेराव्याच वर्षी त्याची आई आपल्या एका मैत्रिणीची शुश्रूषा करीत असतांना ताप येऊन वारली. कँट आपल्या सोळाव्या वर्षी मॅट्रिक्युलेशन पास होऊन कॉलेजांत गेला.<noinclude>{{center|८१}}</noinclude>
8ba8v12v9xwl7algc3koylt5iktqc3m
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८९
104
110339
229999
2026-05-16T11:00:18Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "शिक्षकांचे वेतन मुळी त्यांच्या व्याख्यानांच्या चांगुलपणाघर अवलंबून असे. त्यांची व्याख्याने जर चांगली नसतील तर त्यांच्याकडे विद्यार्थी जाणार नाहीत, व त्यांचे वेतन तर मुलांच्..."
229999
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>शिक्षकांचे वेतन मुळी त्यांच्या व्याख्यानांच्या चांगुलपणाघर अवलंबून असे. त्यांची व्याख्याने जर चांगली नसतील तर त्यांच्याकडे विद्यार्थी जाणार नाहीत, व त्यांचे वेतन तर मुलांच्या फीवर अवलंबून; तेव्हां त्यांना आपले बुद्धिसर्वस्व आपल्या विषयावर खर्च करावे लागे. पगारी प्रोफेसरांना मुलांच्या फीवर विसंबावे लागत नसे. परंतु त्यांचा दर्जा व मान मोठा असल्यामुळे तो राखण्याकरिता त्यांनाहि फार मेहनत करावी लागे. कारण जर त्याची व्याख्याने चांगली नसली व बिनपगारी शिक्षकांची चांगली असली तर मुले बिनपगारी शिक्षकांकडे जातील व असे झाले म्हणजे ती प्रोफेसराला कमीपणाची गोष्ट वाटे. या पद्धतीमुळे बिनपगारी शिक्षक व पगारी प्रोफेसर या दोघांनाहि आपापल्या विषयांत फारच पारंगतता मिळवावी लागते. असो.

{{gap}}बिनपगारी शिक्षक या नात्याने कँटने सुमारे पंधरा वर्षे काढल्यानंतर १७७० साली त्याची महत्त्वाकांक्षा पुरी झाली. त्याला तत्त्वज्ञानाच्या प्रोफेसराची फार मोठ्या मानाची जागा मिळाली, व त्या जागेवर तो मरेपर्यंत होता. दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला प्रोफेसरांच्या जागा देऊ केल्या होत्या, परंतु त्याने आपली युनिव्हर्सिटी सोडली नाही, व तेथली जागा कमी पगाराची असतांना तेथेच राहणे त्याला बरे वाटले .

{{gap}}कँटचे सर्व आयुष्य अध्ययन, अध्यापन आणि लेखन यांमध्येच गेले. यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये किंवा चरित्रामध्ये वैचित्र्य किंवा निरनिराळे प्रसंग नाहीत, हे खरे आहे. त्याचा आयुष्यक्रम अगदी आपल्या इकडल्या ऋषीसारखा होता. कारण, कँट संसारपाशांत पडला नाही. प्रथमतः त्याची फार गरिबी होती, व कुटुंबपोषण करण्यासारखी पैशाची स्थिति नव्हती. यामुळे त्याने लग्न केले नाही. पुढे चांगली स्थिति आल्यावर त्याला लग्न करता आले असते, व एका ईवर कँटचे मनहि गेले होते; परंतु त्या बाईने दुसऱ्या एका गृहस्थाशी लग्न केल्यामुळे कॅटचा बेत तसाच राहिला. पुढे आपले लग्नाचे दिवस निघून गेले, असें समजून कँट ब्रह्मचारीच राहिला. कँटच्या या एकलकोंड्या आयुष्याबद्दल<noinclude>{{center|८३}}</noinclude>
egmeq67jw3jgl3x344dcbmd65pvglis
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८८
104
110340
230000
2026-05-16T11:01:06Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "युनिव्हर्सिटीत त्याने एकंदर सात वर्षे अभ्यास केला. त्याच्या घरची गरीबी असल्यामुळे त्याचे मित्र त्याला थोडी फार पैशाची व इतर आवश्यक गोष्टीची मदत करीत असत आणि त्याच्या मोबदला कँ..."
230000
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>युनिव्हर्सिटीत त्याने एकंदर सात वर्षे अभ्यास केला. त्याच्या घरची गरीबी असल्यामुळे त्याचे मित्र त्याला थोडी फार पैशाची व इतर आवश्यक गोष्टीची मदत करीत असत आणि त्याच्या मोबदला कँट हा त्यांना शिकवीत असे. परंतु हे सर्व दिवस त्याला मोठ्या कष्टानेच काढावे लागले.

{{gap}}१७४६ साली, म्हणजे कॅटच्या २२ व्या वर्षी त्याचा बाप वारला, आणि त्यामुळे कँटला आपले शिक्षण सोडून पोटापाण्याच्या उद्योगाला लागावे लागले. कँटची मोठी महत्त्वाकांक्षा म्हणजे कानिग्सबर्ज विश्वविद्यालयांतील प्रोफेसरची जागा मिळविण्याची होती. परंतु आतां त्याला आपले शिक्षण अर्धवट टाकून, एका सुखवस्तु कुटुंबांतील खासगी शिक्षकाचा धंदा पत्करावा लागला. या रीतीने त्याने नऊ वर्षे काढली, व त्याच्या आयुष्यांतील हा कालच फक्त त्याने कानिग्सबर्जच्या बाहेर घालविला. या काळांत तो तीनचार कुटुंबांत राहिला. १७५५ मध्ये त्याने एक तात्त्विक विषयावर स्वतंत्र ग्रंथ लिहून डॉक्टरची पदवी मिळविली, व नंतर त्याला कॉनिग्सबर्ग विश्वविद्यालयांत बिनपगारी शिक्षकाची जागा मिळाली. तेव्हांपासून मरेपर्यंत म्हणजे सुमारे सतत पन्नास वर्षे, कँटने प्रोफेसराचे काम केले. जर्मन विश्वविद्यालयामध्ये पगारी प्रोफेसराचा दर्जा, पदवी व योग्यता मोठी असे, आपापल्या विषयांत पारंगत अशा लोकांना या जागा मिळत. दुसरा वर्ग बिनपगारी शिक्षकांचा असे. यांना विश्वविद्यालयांतून फक्त शिकविण्याची परवानगी मिळे, परंतु पगार मिळत नसे. विद्यार्थ्यांकडून जी काय फी मिळेल, त्यावरच यांना रहावें लागे. बिनपगारी शिक्षक व प्रोफेसर या दोघांची एकाच विषयावर व्याख्याने होत, व विद्यार्थ्यांना पाहिजे त्या व्याख्यानाना जाण्याची मोकळीक असे, जर्मनीतील एकंदर शिक्षण उच्च दर्जाचे राहण्यास या पद्धतचिा फार उपयोग झालेला आहे. जर्मनीतील विश्वविद्यालयाची युरोपांतील इतर विश्वविद्यालयांच्या वर कमान असण्याचे मुख्य कारण ही पद्धति होय, यांत शंका नाही. कारण, या पद्धतीमुळे शिक्षकांच्या दोन्ही वर्गाना आपापल्या विषयाची उत्तम तयारी करावी लागे. बिनपगारी<noinclude>{{center|८२}}</noinclude>
f4smr6iewjmb6yb8w43dzuq5ldesnid
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९०
104
110341
230001
2026-05-16T11:01:39Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{gap}}गांवांतील लोकांना त्याची कीव येत असे, व त्या शहरांतील एका साध्या भोळ्या उपाध्यायाला त्याची कीव येऊन त्याने एक संभाषणात्मक लेख छापला व त्यांत गृहस्थाश्रम स्वीकारणे हे प्रत्य..."
230001
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{gap}}गांवांतील लोकांना त्याची कीव येत असे, व त्या शहरांतील एका साध्या भोळ्या उपाध्यायाला त्याची कीव येऊन त्याने एक संभाषणात्मक लेख छापला व त्यांत गृहस्थाश्रम स्वीकारणे हे प्रत्येक माणसाचे कर्तब्य आहे, व गृहस्थाश्रम हा फार सुखदायी आश्रम आहे असेंहि प्रतिपादन करून कँटला लग्न करण्याचा आग्रह केला होता. हा लेख वाचून वृद्ध कॅटला उप ध्यायाच्या आग्रहाचे हंसू आले. कँटने छापण्याचा खर्च त्या उपाध्यायाला दिला व विनोदाची गोष्ट म्हणून तो ही हकीकत आपल्या स्नेही मंडळीला सांगत असे.

{{gap}}परंतु आपल्या ब्रह्मचर्याबद्दल स्तोम माजविलेलें त्याला आवडत नसे. त्याचा बहतेक वेळ शिकणे, शिकविणे व लिहिणे यांत जात असे. यामुळे त्याला पुढे लग्नाची आवश्यकता भासली नाही. शिवाय, कँटसारख्या विद्वान् व बहुश्रुत तत्वज्ञान्याला योग्य अशी स्त्री मिळणेहि काठणच होते. परंतु यावरून कॅट हा एकलकोंडा होता, किंवा त्याला एकलकोंडा आयुष्यक्रम आवडत असे अशांतला प्रकार नाही. त्याला स्नेहा-सोबत्यांची फार हौस असे, व त्याला सुस्थिति आल्यावर व त्याने बिऱ्हाड केल्यावर तो रोज आपल्या पंक्तीला आपल्या मित्रमंडळीतील शेलक्या लोकांना जेवावयास बोलवीत असे. केव्हांकेव्हां वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाहि तो जेवावयास बोलवीत असे. कँटला संभाषणाची कला फार चांगली: आवगत असे, व त्याला संभाषणाची कलाहि फार उत्तम साधलेली असे. शिवाय त्याचे संभाषण मनोवेधक असून त्यांत विषयवैचित्र्यहि फार असे. पुष्कळ लोकांच्या संभाषणांत त्यांच्या नेहमीच्या व्यवसायाचे घोडें सारखं पुढे यावयाचे. हा दोष कॅटच्या संभाषणांत केव्हांहि नसे. तो तत्वज्ञानासंबंधी केव्हाही संभाषण करीत नसे; कारण, तो म्हणे, संभाषणाचा तो विषय नव्हे. कँट फारच बहुश्रुत होता; तो प्रत्येक माणसाजवळ त्याच्या आवडत्या विषयावर बोले; व त्याच्याकडून माहिती काढून घेई; आणि आपल्याला असलेली माहिती सहजगत्या<noinclude>{{center|८४}}</noinclude>
pu8k471r7nx5674qrn1rqm1b1t64fac
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९१
104
110342
230002
2026-05-16T11:04:36Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दुसऱ्याला करून देई. यामुळे कँटच्या घरी जेवावयास जाणे म्हणजे भाग्याचे आहे असे सर्वांना वाटे.
{{gap}}कँट हा फार नियमितपणे चालणारा मनुष्य असल्यामुळे व त्याचा व्यवसायहि वैचित्र्यवि..."
230002
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>दुसऱ्याला करून देई. यामुळे कँटच्या घरी जेवावयास जाणे म्हणजे भाग्याचे आहे असे सर्वांना वाटे.

{{gap}}कँट हा फार नियमितपणे चालणारा मनुष्य असल्यामुळे व त्याचा व्यवसायहि वैचित्र्यविहीन असल्यामुळे कँटच्या आयुष्याचे चित्र रेखाटणे सोपे आहे. कारण, एक दिवसाचा क्रम तोच आठवड्याचा, तोच महिन्याचा व तोच वर्षांचा. हा त्याचा नियमितपणा आश्चर्य करण्यासारखा होता. त्याची सर्व कामें घड्याळाप्रमाणे चालत असत. त्याच्या दिनचर्येचें खालील वर्णन त्याच्या चरित्रकारांनी दिलेले आहे.

{{gap}}पहाटेला पांच वाजायला पांच मिनिटें कमी असतांना कँटचा नोकर लॅपी हा कँटच्या खोलीत शिरावयाचा व “प्रोफेसरसाहेब. वेळ झाली" असे म्हणावयाचा. या हाकेला कँट कधीहि न चुकतां ओ द्यावयाचा. व पांच मिनिटांत तो आपल्या बसावयाच्या खोलीत यावयाचाच. न्याहारीला तो चहाचा एक पेला-कधी कधी नकळत दोन तीन पेलेहि घेत असे-व तंबाकूची एक विडी घेई. ५ पासून ७ वाजेपर्यंत तो व्याख्यानाची तयारी करी. ७ वाजतां तो आपल्या शिकवावयाच्या वर्गात जाई व तेथन ९ वाजतां परत येई. तेव्हांपासून पाऊण वाजेपर्यंत तो आपल्या लेखनव्यवसायांत गुंतलेला असे. पाऊण वाजतां 'पाऊण झाला' असें म्हणून आपल्या स्वयंपाकिणीला हांक मारी, व त्याबरोबर स्वयंपाकीण दारूचा पेला घेऊन येई. जेवणाचे पहिले वाढप झाल्यावर कँट हा पेला पीत असे. त्याच्या आयुष्याच्या शेवटची पंचवीस वर्षे-(जेव्हां त्याचें स्वतंत्र घर असे) त्याच्याबरोबर नेहमी पाहुणे जेवावयास असत. पाहणे दोहोंपेक्षा कमी नसत व पांचापेक्षा जास्त नसत. या पाहुण्यांना जेवणाच्या दिवशींच्या सकाळी बोलावणे पाठविले जात असे. एकदम बोलावणे करून ठेवणे त्याला आवडत नसे, किंवा आधीपासून केलेलेंहि आवडत नसे; परंतु कँट आपल्या पाहुण्यांपासून एका गोष्टीची अपेक्षा करी. व ती म्हणजे नियमितपणा ही होय! सर्व पाहुणे जमले, म्हणजे लपी जेवणाच्या तयारीची वर्दी देई. हवेबद्दल बोलत बोलत सर्व मंडळी<noinclude>{{center|८५}}</noinclude>
er7ptzpc61l9ww3e35jq4rse3ctrym9
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९२
104
110343
230004
2026-05-16T11:05:32Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "जेवणाच्या जागीं जमे. कँट आपला रुमाल बाहेर काढून सर्वांना सुरुवात करण्यास सांगे, व आपणहि जेवावयास सुरुवात करी. जेवण: बहुधा तीन वाढी असे, व तें सुमारे तीन व केव्हां केव्हां चार तासहि..."
230004
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>जेवणाच्या जागीं जमे. कँट आपला रुमाल बाहेर काढून सर्वांना सुरुवात करण्यास सांगे, व आपणहि जेवावयास सुरुवात करी. जेवण: बहुधा तीन वाढी असे, व तें सुमारे तीन व केव्हां केव्हां चार तासहि चाले. जेवणाच्या वेळीं पुष्कळ वेळां राजकीय विषयांवर संभाषण होई. कँट हा वर्तमानपत्रांचा मोठा भोक्ता होता, व वर्तमानपत्रे आणणाऱ्या पोस्टाकडे मोठ्या आस्थेनें त्याचे डोळे लागलेले असत.त्या वेळीं युरोपांत फ्रान्स-मधल्या राज्यक्रांतीची खळवळ चालू असे, व त्याच्या आधी अमेरिकेतील स्वतंत्रतेकरितां युद्ध झाले, त्याची खळवळ चालू असे. कँटचा ओढा नेहमी स्वातंत्र्याकडे व प्रजापक्षाकडे अरे, जेव्हां फ्रान्समध्ये प्रजा-सत्ताक राज्य स्थापन झाल्याची बातमी त्यानें ऐकली, तेव्हां तो म्हणाला, आज माझ्या डोळ्यांचें पारणे फिटले ! आतां मी सुखानें मरेन ! "

{{gap}}जेवण आटोपल्यावर म्हणजे ४ वाजल्यानंतर कॅट फिरावयास निघे. पहिल्यांदा तो इतर लोकांबरोबर फिरावयास जाई, पण पुढे पुढे तो एकटा फिरावयास जात असे. कारण नाकांतून श्वासोच्छ्वास केल्यानें रोगजंतु पोटांत जाणार नाहीत, असे त्याला वाटे. व म्हणून तो फिरतांना व बोलतांना तोंड मिटून चालत असे. त्याचा दुसरा एक नियम असे, तो हा कीं, केव्हांही अंगाला घाम येतां कामा नये. कॅट हा नाजूक प्रकृतीचा होता; धट्टाकट्टाही नव्हता, किंवा तो नेहमीं आजारी असेही नाहीं. तरी पण खाण्यापिण्यासंबंधी व वागण्यासंबंधी बाताबेतानें राहून तो इतकी वर्षे जगला. रपेट करून आल्यावर बारीकसारीक कामे करावयाची, नवीन पुस्तकें चाळावयाचीं व वर्तमानपत्रे पहावयाची, काळोख पडल्यावर तो आपल्या आवडत्या विषयावरील प्रश्नासंबंधी विचार करीत बसे, रात्री दहांच्या सुमाराला तो निजावयास जाई. ही त्याची दिनचर्या दिवसानुदिवस, मासानुमास व वर्षानुवर्ष चाले.

{{gap}}त्याच्या या व्यवसायासंबंध एक मजेदार गोष्ट सांगतात. कँट हा आपल्या अभ्यासाच्या खोलीत बसून विचार करी व मनाची एकाग्रता होण्याकरतां आपल्या खिडकींतून दिसणाऱ्या एका देवळाच्या मनोऱ्या-<noinclude>{{center|८६}}</noinclude>
3ssae4kp3krek2qlxynijpuj09ldf3u
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९३
104
110344
230005
2026-05-16T11:06:15Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कडे पहात असे. त्या मनोऱ्याच्या टोकाकडे दृष्टि दिली, म्हणजे त्याचे चित्त एकाग्र होऊन त्याची विचारशक्ति चांगली चाले. परंतु कॅटच्या शेजाऱ्याच्या बागेत पॉपलर नांवाचे वृक्ष होते, ते..."
230005
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>कडे पहात असे. त्या मनोऱ्याच्या टोकाकडे दृष्टि दिली, म्हणजे त्याचे चित्त एकाग्र होऊन त्याची विचारशक्ति चांगली चाले. परंतु कॅटच्या शेजाऱ्याच्या बागेत पॉपलर नांवाचे वृक्ष होते, ते वाढत वाढत जाऊन एके दिवशी तो मनोरा कँटच्या दृष्टिआड झाला. या आडकाठीने कॅटच्या चित्ताची एकाग्रता न साधून त्याच्या विचाराच्या व्यवसायांत व्यत्यय येऊ लागला. आपल्याला यामुळे काही सुचत नाही असे कँट आपल्या मित्राजवळ बोलला. त्या मित्राने ही अडचण त्या शेजाऱ्याला सांगितली.शेजारी चांगला भला मनुष्य होता व त्याला कँटबद्दल आदरहि होता.तेव्हां त्याने आपली पॉपलर झाडे छाटून टाकली व कॅटला तो मनोरा पुनरपि दिसू लागला, आणि तेव्हापासून त्याच्या विचारांचे काम पुनः निर्वेधपणे चालू झालें !

{{gap}}त्याच्या असल्याच संवयीची आणखीहि एक गोष्ट सांगतात. कँट वात व्याख्यान देतांना बहुधा एका विवक्षित मुलाकडे पहात असे व विशेषतः त्याच्या एका बटणाकडे पहात राही; परंतु एके दिवशी त्या मुलाच्या कोटाचे बटन पडून गेले व त्या दिवशी कॅटच्या व्याख्यानाचा अगदी घोटाळा झाला. त्याला नेहमी प्रमाणे बोलतां येईना व क्रमवार विचार सुचेनात!

{{gap}}कॅटचे मुख्य व्यवसाय दोन, हे वर सांगितलेच आहे. एक लेखन व दुसरा अध्ययन. कँट हा फार मोठा तत्त्वज्ञानी होऊन गेला, अशी जरी त्याची कीर्ति आहे तरी तो मारूनमुटकून तत्वज्ञानी झाला, असें म्हणण्यास हरकत नाही. कारण लहानपणापासून त्याचे आवडते विषय म्हणजे गणित व आधिभौतिक शास्त्रे हे होते. अगदी लहानपणापासून त्याला न्यूटनच्या ग्रंथांचा फार नाद लागलेला होता. तत्वज्ञानाकडे त्याचे लक्ष्य मागाहून गेले व हाच विषय शेवटी त्याचा मुख्य विषय बनला. पण कॅट हा केव्हांहि घटपटाची खटपट करणारा तत्वज्ञानी बनला नाही. त्याच्या अंगी बहुश्रुतपणा व विषयवैचित्र्याची अभिरुचि शेवटपर्यंत कायम राहिली. सामग्रंथ व लेख निरनिराळ्या विषयांवर आहेत. तो मासिक पुस्तकांत<noinclude>{{center|८७}}</noinclude>
bf4ev4v8p5v490613pxs8y9pkxw2q0n
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९४
104
110345
230006
2026-05-16T11:07:04Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रचलित विषयांवर लेख लिहीत असे. त्याच्या लेखांची भाषा दुर्बोध नसे. त्याचे काही काही लेख तर फारच मनोरंजक व विनोदाने भरलेले आहेत.
{{gap}}जरी कँटचे तत्वज्ञानविषयक ग्रंथ फार दुर्बोध अ..."
230006
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रचलित विषयांवर लेख लिहीत असे. त्याच्या लेखांची भाषा दुर्बोध नसे. त्याचे काही काही लेख तर फारच मनोरंजक व विनोदाने भरलेले आहेत.

{{gap}}जरी कँटचे तत्वज्ञानविषयक ग्रंथ फार दुर्बोध असले तरी तो शिक्षक या नात्याने फार चांगला वक्ता असे. नवीन मुलांच्या मनांत विषय भरवून देण्याचे कसब त्याला चांगले साधलेले होते. तो वर्गात जणूं काय एखाद्या तत्वज्ञानविषयक विचारसरणीचा प्रयोग करून दाखवी. प्रत्यक्ष माहिती सांगण्यापेक्षां विद्यार्थ्यांना तो विचार करण्यास शिकवी, असे म्हणणे जास्त बरोबर होईल. तसेंच विषयाचे विवेचन करतांना तो दाखले, उदाहरणे, गोष्टी इत्यादि सांगे. यामुळे त्याचे व्याख्यान फार मनोरंजक होई. मागे सांगितलेच आहे की, तो निरनिराळ्या विषयांवर व्याख्यानमाला चालू करीत असे. काही विषयांवरील त्याची व्याख्याने फारच लोकप्रिय असत. भूगोलविषयक पदार्थविज्ञानशास्त्र हा विषय त्याचा हातखंडा असे व गांवांतील प्रौढ गृहस्थ, सैन्यांतील अधिकारी, व्यापारी वगैरे लोक सुद्धा कँटची ही व्याख्याने ऐकावयास येत असत. तसंच पदार्थविज्ञानशास्त्र, किंवा ज्याला अर्वाचीन काळी समाजशास्त्र म्हणतात, त्याविषयावरील कँटची व्याख्यानमालाही फार लोकप्रिय असे. कारण तो प्रत्येक विषयाची संपूर्ण माहिती मिळवून तिचे आपल्या मनाशी तादात्म्य करून घेई. यामुळे त्याचे ज्ञान अगदी सत्यमय असे, व म्हणून त्याचा ठसा दुसयाच्या मनावर तो बरोबर वठवून देई.

{{gap}}इ. स. १७५५ मध्ये लिसबन शहरी फार मोठा धरणीकंप झाला. त्याबरोबर या विलक्षण सृष्टिचमत्काराची माहिती देण्याकरतां कँटने एक उत्तम लेख 'धरणीकंप' या विषयावर लिहिला व त्यांत या संबंधाची उपलब्ध माहिती व या चमत्काराची उपपत्ति यांचे सुरस विवरण केले. १७६० च्या सुमारास स्वीडनबार्ज नांवाचा मनुष्य प्रसिद्धीस आला. आपल्याला अतींद्रियज्ञान आहे व आपल्याला मेलेल्यांच्या आत्म्याच्या संभाषण करता येते, असे तो म्हणे. कॅटला या विषयासंबंधी माहित मिळविण्याची इच्छा झाल्यामुळे त्याने स्वीडनबार्जच्या ग्रंथावर सात<noinclude>{{center|८८}}</noinclude>
cj6rx94ic12m85xuuq278hsspc35ew7
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९५
104
110346
230007
2026-05-16T11:07:43Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "खर्च केले व आपल्या स्नेह्यांच्या आग्रहावरून त्याने यासंबंधी एक सुरेख ग्रंथ लिहिला. या ग्रंथांत त्याने शास्त्राय तत्वांवर,अशा गोष्टींचे ज्ञान मानवी शक्तीच्या बाहेर आहे, असे आप..."
230007
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>खर्च केले व आपल्या स्नेह्यांच्या आग्रहावरून त्याने यासंबंधी एक सुरेख ग्रंथ लिहिला. या ग्रंथांत त्याने शास्त्राय तत्वांवर,अशा गोष्टींचे ज्ञान मानवी शक्तीच्या बाहेर आहे, असे आपले मत प्रतिपादन केले. यावरून कँट हा फार बहुश्रुत होता, असे दिसून येईल.

{{gap}}कॅटमध्ये इतका बहुश्रुतपणा येण्याचे कारण त्याची वाचनाभिरुचि तर खरी, परंतु त्याची कल्पकता व कल्पनाशक्ति या फार दांडग्या होत्या: यामुळेच त्याला इतक्या विषयांचे सोपपत्तिक व साग्र ज्ञान मिळवितां आले. त्याची कल्पनाशक्ति केवढी दांडगी होती, याचा प्रत्यय खालील दोन गोष्टींवरून चांगला येतो.

{{gap}}डी क्वेन्सी या इंग्रज ग्रंथकाराने या गोष्टीचे मोठ्या विरोधाभासाने वर्णन केले आहे. तो म्हणतो:-" कँटने एकही पुस्तक आजन्मांत वाचले नाही, असें मी बेलाशक विधान करतों व हे माझे म्हणणे मी शाबीतही करतो ! सकृदर्शनों हे विधान अगदी खोटे दिसते. ज्याची बहश्रुतपणाबद्दल इतकी ख्याति, तो मनुष्य एकही पुस्तक वाचीत नाही, हे संभवनीय तरी कसे होईल ? परंतु कॅट हा समग्र पुस्तक केव्हांहि वाचीत नसे. हे अगदी खरे आहे ! कोणतेंहि पुस्तक असले म्हणजे ते आपले शब्दशः वाचीत जावयाचे, अशी त्याची रीत नव्हती. तर मधूनमधून तो पुस्तक वाची, काही भाग वाचला म्हणजे त्या पुढे ग्रंथकाराने काय लिहिले असले पाहिजे, हे तो आपल्या कल्पनेने जाणून तो भाग टाकून पुढे जाई. सारांश, तो पुस्तकांतील एकंदर मतलब व नवे विचार तेवढे ध्यानांत धरी: बाकी विषयाचा आपल्या पूर्वं च्या ज्ञानावरून तो अंदाज करी, परंतु अशा अर्धवट वाचनाने त्याचे ज्ञान अर्धवट होई, असे मात्र नाही. तो पूर्वी ठाऊक असलेली माहिती वाचण्यांत वेळ घालवीत नसे, इतकेंच. या त्याच्या वाचनपद्धतीमुळे त्याला बहुश्रुतपणा व विषयवैचित्र्याभिरुचि ही मिळवितां आली."

{{gap}}दुसरी त्याच्या कल्पनेची गोष्टही आश्चर्य करण्यासारखी आहे. मागे सांगितलेच आहे की, कॅट हा आपले गांव सोडून कचितच जात असे,<noinclude>{{center|८९}}</noinclude>
81fsma5rd56r65snou6sxqnkputn892
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९६
104
110347
230008
2026-05-16T11:08:47Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "त्याने कानिग्सबर्जपासून समुद्र जवळ असतांना सुद्धां समुद्र आजन्मांत पाहिला नव्हता! तरी पण त्याला भूगोलाचे ज्ञान फारच असे व त्याची कल्पनाशक्ति इतकी तीव्र होती की तो आपल्या कल्प..."
230008
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>त्याने कानिग्सबर्जपासून समुद्र जवळ असतांना सुद्धां समुद्र आजन्मांत पाहिला नव्हता! तरी पण त्याला भूगोलाचे ज्ञान फारच असे व त्याची कल्पनाशक्ति इतकी तीव्र होती की तो आपल्या कल्पनेने सर्व विषयांचे स्वरूप आपल्या मनापुढे उभे करीत असे व यामुळे तो हुबेहूब वर्णन करूं शके, एका व्याख्यानांत कॅट हा इंग्लंडमधील वेस्टमिनिस्टर पुलाची माहिती सांगत होता. ती माहिती सांगत असतांना त्याने त्या पुलाचें अगदी हुबेहूब वर्णन केले. त्या व्याख्यानाला एक इंग्रज गृहस्थ हजर होता. व्याख्यानाच्या शेवटी त्याने कॅटची मुलाखत घेतली व "आपण इंग्लंडांत किती वेळ गेला होतां ? " असे त्याने त्याला विचारले. त्यावर " आपण इंग्लंड पााहेलेही नाही," असे त्याने उत्तर दिले. हे ऐकून तो इंग्रज गृहस्थ थक्क झाला. त्याला कांहीं तें खरें वाटेना! कॅट जी जी माहिती ग्रंथांवरून व प्रवासवृत्तावरून मिळवी, तिच्याशीं तो आपल्या मनाचे तादात्म्य करून घेई व त्याचे बरोबर स्वरूप मनांत ठेवी. या कल्पनाशक्तीमुळे त्याची भूगोलविषयक व्याख्याने इतकी उत्तम वठत असत, वास्तविक पाहतां भूगोलविषयक पदार्थविज्ञानाला प्रत्यक्ष अवलोकन जास्त पाहिजे, तसेंच लोकांच्या चालीरिती, मनुष्यांच्या प्रकाराच वर्णन, मनुष्यांतील वर्णभेद वगैरे समाजशास्त्रीय गोष्टींना अवलोकन व प्रवासाची जास्त जरूर आहे. कॅट हा प्रवासी नसतांना सुद्धा या दोन विषयांत त्याचा हातखंडा असे.

{{gap}}जरी कँट कधी प्रवास करीत नसे, तरी त्याची अवलोकनशक्ति सूक्ष्म होती, यांत शंका नाही. त्याने 'सौंदर्य व भव्यता' या विषयावर १७६४ मध्ये एक उत्तम निबंध लिहिला. तो भाषेच्या व मनोरंजकतेच्या दृष्टीने त्याच्या उत्तम ग्रंथांपैकी एक आहे, यांमध्ये कॅटची सूक्ष्म अवलोकनश चांगली दिसून येते.

{{gap}}येथपर्यंत कँटच्या बहुश्रुतपणाचे थोडक्यांत विवरण केले, परंतु कँटची कीर्ति मुख्यतः त्याच्या तत्वज्ञानविषयक ग्रंथांवरून झालेली आहे. त्याच्या तात्विक व इतर ग्रंथांविषयींचें थोडक्यांत विवेचन पुढे करावयाचे आहे.<noinclude>{{center|९०}}</noinclude>
6zf6itvhvnlnro259u093jge0qqday9
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९७
104
110348
230009
2026-05-16T11:09:29Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "येथे त्याच्या विचारांचा एकंदर युरोपवर कसा परिणाम झाला, एवढे सांगणे अवश्य आहे; तथापि तें करण्यापूर्वी त्याच्या राहणींतील व त्याच्या विशेष संवयींतील एकदोन गोष्टी सांगून हा विषय..."
230009
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>येथे त्याच्या विचारांचा एकंदर युरोपवर कसा परिणाम झाला, एवढे सांगणे अवश्य आहे; तथापि तें करण्यापूर्वी त्याच्या राहणींतील व त्याच्या विशेष संवयींतील एकदोन गोष्टी सांगून हा विषय संपवू.

{{gap}}कँटला आपल्या नित्य ब्यवहारांत व नियमितपणांत व्यत्यय आलेला कधीच सहन होत नसे. एकदां कँट एका मोठ्या सरदाराच्या अत्याग्रहावरून त्याच्या गाडीतून बाहेर गेला; परंतु त्यामुळे त्याला त्या सरदाराच्या तब्बेतीप्रमाणे गाडीतून सावकाश व लांब वळसे घेऊन जावे लागले, व तेणेकरून त्याच्या ठरलेल्या कार्यक्रमांत बिघाड झाला. तेव्हांपासून कँटनें असा नियम केला, की, ज्या गाडीवर आपली पूर्णपणें हुकमत नाही, त्या गाडीत कधीही बसावयाचें नाहीं !

{{gap}}कँट बारिकसारिक गोष्टीकडोहि लक्ष्य देत असे. त्याच्या खोलीतील व्यवस्थेत फरक झालेला त्याला चालत नसे. तसेंच, नोकराकडून बरोबर काम झालेच पाहिजे, अशी त्याची सक्ती असे. त्याचा नोकर लॅपी हा जरा शिथिल स्वभावाचा होता; परंतु तो कँटची तरतूद नीट राखीत असे. पुढे पुढे तो फारच अनियमित बनला व त्यामुळे कॅटला त्याला काढून टाकावे लागले.

{{gap}}कॅटला शब्दांचे उच्चार व नांवाचे उच्चार कोणी चुकीचे केल्यास तें मुळीच खपत नसे. परंतु लँपी तर मृपिंडबुद्धि असल्यामुळे तो अशा चुका नेहमी करी, व कँट त्याला पढवीत असे. त्यामुळे कँटकडे येणाऱ्या पाहुण्यांस एक प्रकारचा फार्स नेहमी पहावयास सांपडे. कँटकडे हार्टगचें वर्तमानपत्र नेहमी येत असे; परंतु लॅपी या नांवाबद्दल नेहमी चूक करी. लँपी म्हणे " प्रोफेसरसाहेब हे हार्टमनचे वर्तमानपत्र घ्या." यावर कॅट म्हणे " काय ? तू काय म्हणतोस ? हार्टमनचे वर्तमानपत्र ? मी तुला सांगतों, हार्टमन नव्हे, हार्टग ! आतां माझ्याप्रमाणे म्हण पाहूं-हार्टमन नव्हे हार्टग" लॅपी एकाद्या फलटणीतील शिपायाप्रमाणे एकसारख्या स्वराने ते शब्द उच्चारी. त्याच्याकडून कँट असें त्रिवार म्हणून घेई, व ज्या ज्या वेळी तें वर्तमानपत्र ( आठवड्यांतून दोनदां) येई, त्या त्या<noinclude>{{center|९१}}</noinclude>
rzad1ib2tizndzkcb4b5j8e667ive3a
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९८
104
110349
230010
2026-05-16T11:10:16Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "वेळी लपीने हटकून ही चुकी करावयाची, व कँटने त्याचेकडून संथा घेववावयाची ! हा क्रम कित्येयकतरी वर्षे चालला होता. तरी शेवटपर्यंत लँपांच्याने चूक सुधारली नाही व कँटलाहि या संथा देण्य..."
230010
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>वेळी लपीने हटकून ही चुकी करावयाची, व कँटने त्याचेकडून संथा घेववावयाची ! हा क्रम कित्येयकतरी वर्षे चालला होता. तरी शेवटपर्यंत लँपांच्याने चूक सुधारली नाही व कँटलाहि या संथा देण्याचा कंटाळा आला नाही.

{{gap}}आतां कँटच्या चरित्रांतील बाह्यांग सोडून अंतरंगाकडे वळू या. कारण कॅटचे सर्व चारत्र मुळी चिन्मय आहे. त्याचे अवतारकार्य मनुष्यामध्ये विचारक्रांति करण्याचे होते, व ते त्याच्या लेखांनी पूर्णपणे घडवून आणले. कँटला सत्यज्ञानाची फार आवड होती. लोकांमधील अंधश्रद्धा नाहींशी होऊन लोक विचारी व सदाचरणी व्हावे, असाच त्याचा हेतु होता. त्याच्या नीतिविषयक ग्रंथांचा परिणाम लोकमतावर फारच झाला त्याचकाळी युरोपमध्ये सुखलालसा व विषयसुखेच्छा फार झाली होती, मनुष्याची इतिकर्तव्यता म्हणजे सुख मिळविणे, अशा प्रकारचे विचार फार पसरलेले होते. त्याविरुद्ध कॅटच्या लेखांचा रोख होता. मनुष्याने सुखेच्छा सोडून सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे करावे, असे कँटचे मत होते. कर्तव्य कर्तव्यबुद्धीने केले पाहिजे, हीच मानवी इतिकर्तव्यता, असे तो प्रतिपादन करीत असे,व कँटचा आयुष्यक्रम या त्याच्या मताप्रमाणेच असे. 'बोले तैसा चाले' या कोटीपैकी कँट हा होता. त्याला भितरेपणा हा ठाऊकच नव्हता ! जे आपल्याला योग्य वाटेल तें स्पष्टपणे बोलण्यास व लिहिण्यास तो कधीच कचरत नसे. ईश्वर वर त्याचा भरंवसा होता, परंतु कर्मकांडावर त्याचा मुळींच विश्वास नसे. तो प्रार्थनांमंदिरांत प्रार्थनेला कधींहि जात नसे. रेक्टर या नात्याने त्याला कॉलेजांतील विद्यार्थ्यांना मदिरांत न्यावे लागे, त्या वेळी तो मंदिराच्या दारापर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन जाई व स्वतः तेथूनच परत जाई. त्याच्या मताप्रमाणे मनुष्याची सर्व वागणूक हीच मुळी प्रार्थना होय. मनुष्याने सर्व व्यवहारांत आपले कर्तव्य बजावले, म्हणजे ईश्वराची खरी भाक्ति झाली, असे तो समजत असे.

{{gap}}कॅटच्या असल्या धर्ममतांबद्दल व ती मते एका ग्रंथांत प्रतिपादन<noinclude>{{center|९२}}</noinclude>
j6trw7h6ik9h4vmcfdw64vcjy0mjeko
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९९
104
110350
230011
2026-05-16T11:10:49Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "केल्याबद्दल कँटवर जर्मन सरकारचा रोष झाला. कँटने आपल्या वर्तनाने आपल्या मताचे समर्थन केले; परतु सरकारच्या मर्जीखातर महाराजांचा राजनिष्ठ प्रजाजन या नात्याने मी या पुढे या विषया..."
230011
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>केल्याबद्दल कँटवर जर्मन सरकारचा रोष झाला. कँटने आपल्या वर्तनाने आपल्या मताचे समर्थन केले; परतु सरकारच्या मर्जीखातर महाराजांचा राजनिष्ठ प्रजाजन या नात्याने मी या पुढे या विषयावर लिहिणार नाही व बोलणार नाही, असे त्याने लिहून दिले, 'महाराजांचा राजनिष्ठ प्रजाजन' म्हणजे 'त्यावेळच्या राजाच्या हयातीपर्यंतचे आपले अस्तित्व' असा कँटने अर्थ मनांत धरला होता, व त्या राजाच्या मरणानतर त्याने धर्मविषयक एक ग्रंथ प्रसिद्ध केला. याप्रसंगी कँटच्या हातून चूक झाली, असे म्हणणे भाग आहे. या वेळी 'नरो वा कुंजरो वा' अशाच प्रकारचे कॅटचे वर्तन झाले, असे म्हणणे प्राप्त आहे. जो गृहस्थ आपल्या लेखणीत व लेखांत इतका विलक्षण धीट होता, तोच राजा पुढे भ्याला, असे याप्रसंगी वाटल्याखेरीज रहात नाही. परंतु ‘एको हि दोषो गुणसंन्नपाते निमज्जतीन्दोः किरणविवाकः' या न्यायाने कँटच्या एकंदर उदात्त चरित्रांत हा एक कमीपणा पार नाहीसा होतो. कँट इ. १८०४ मध्ये मृत्यु पावला.{{nop}}<noinclude></noinclude>
jrba763zfb7fzx33to5rezrb4pvx1tq
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१००
104
110351
230012
2026-05-16T11:11:32Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{center|(२)}} {{center|{{xx-larger|'''कँटच्या पूर्वीचे तत्त्वज्ञान'''}}}}
{{gap}}कॅट आपल्या इच्छेविरुद्ध नाइलाजाने तत्त्वज्ञानी बनला, असे म्हटले तरी चालेल. कॉलेजमध्ये त्याचे आवडते विषय म्हणजे गणित, ज्योत..."
230012
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{center|(२)}}
{{center|{{xx-larger|'''कँटच्या पूर्वीचे तत्त्वज्ञान'''}}}}

{{gap}}कॅट आपल्या इच्छेविरुद्ध नाइलाजाने तत्त्वज्ञानी बनला, असे म्हटले तरी चालेल. कॉलेजमध्ये त्याचे आवडते विषय म्हणजे गणित, ज्योतिषशास्त्र व इतर आधिभौतिक शास्त्रे. त्याने इंग्लंडांतला प्रसिद्ध गणिती व ज्योतिषी न्यूटन याच्या ग्रंथांचे आस्थेनें व काळजीपूर्वक अध्ययन केले होते; नव्हे त्याने आकाशांतील तारागणांसंबंधी एक ग्रंथ लिहून त्यांत सूर्यमालेच्या उत्पत्तीची न्यूटनच्या आकर्षणतत्त्वाच्या आधारे एक उपपत्ति बसविली होती. त्याचे काळी सर्व आधिभौतिक शास्त्रांची झपाट्याने वाढ होत होती व कँटने या सर्व शास्त्रांतील नवीन शोधांची माहिती करून घेतली होती. गणितशास्त्राचे सिद्धांत व आधिभौतिक शास्त्रांतील नियम हेच काय ते सत्यस्वरूप व खात्रीचे मानवी ज्ञान होय अशी कँटची समजूत होती. कारण हे सर्व ज्ञान अनुभवाच्या व संवेदनांच्या आधारावर उभारलेले असल्यामुळे त्याचा पाया भरभकम आहे असे कॅटला वाटे. कॉलेजांत असतांना कँटने जर्मन युनिव्हर्सिटीत शिकविले जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला होता. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञानी लेबीनटझ याच्या तत्त्वज्ञानविषयक विचारांना व्यवस्थित पण संकुचित सूत्रमय असे स्वरूप वुल्फ या तत्त्वज्ञान्याने दिले होते; ते तत्त्वज्ञान कॅटच्या वेळी त्याचे युनिव्हर्सिटीत शिकविले जात असे व म्हणूनच युनिव्हर्सिटीत असतांना कॅटला तें शिकावे लागले होते. पण या तत्त्वज्ञानाबद्दल त्याला फारशी खात्री वाटत नसे. हे तत्त्वज्ञान कच्या पायावर उभारलेले आहे असें त्याला वाटे. सारांश, तरुण वयांत कॅटचा सर्व भर आधिभौतिक ज्ञानावर होता. मानवी ज्ञानांत जर कोणतें ज्ञान निश्चित,त्रिकालाबाधित व सर्वथा सत्यमय<noinclude>{{center|९४}}</noinclude>
1738k878y3k83gwrmc74jxvravi1f3s
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०१
104
110352
230013
2026-05-16T11:12:10Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "असेल तर ते अनुभव व संवेदना यांनी दिलेले आधिभौतिक शास्त्रांतील ज्ञान होय अशी त्याची दृढ श्रद्धा होती. अशा मनःस्थितीत असतां इंग्रजी तत्ववेता ह्यूम याचे संशयवादी पंथ कॅटचे हाती पड..."
230013
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>असेल तर ते अनुभव व संवेदना यांनी दिलेले आधिभौतिक शास्त्रांतील ज्ञान होय अशी त्याची दृढ श्रद्धा होती. अशा मनःस्थितीत असतां इंग्रजी तत्ववेता ह्यूम याचे संशयवादी पंथ कॅटचे हाती पडले, ह्यूमनें आपल्या ग्रंथांत अनुभव व संवेदन या ज्ञानाच्या आधाराचे दोष दाखवून मानवी प्राण्याला कोणतेंहि ज्ञान शक्य नाही व म्हणून संशयवाद शेवटी शिल्लक राहतो असें प्रस्थापित केले होते. हे ग्रंथ वाचून 'आपण श्रद्धेच्या झोपेतून जागे झालो' असे कँटने म्हटले आहे. मानवी प्राण्याला ज्ञान मिळविणे शक्य आहे व गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांमध्ये सत्य ज्ञान आहे अशी कँटची मनोदेवता त्याला सांगत होती. ह्यूमचे म्हणणे खरें धरले तर सर्व ज्ञान टाकाऊ ठरते. तेव्हा हे गौडबंगाल काय आहे; तत्त्वज्ञान्यांची कोठे तरी मोठी घोडचूक होत असावी; तेव्हां ती घोडचूक शोधून काढणे-गणित व आधिभौतिक शास्त्रांच्या समर्थनार्थ तरी-आवश्यक असे कँटला वाटून त्याने तत्त्वज्ञानाचा प्रश्न हाती घेऊन त्याचा आरंभापासून तलास लावण्याचा विडा उचलला व त्याचेच फल म्हणजे कॅटचे परीक्षणात्मक तत्त्वज्ञान होय. म्हणूनच कँटचे तत्त्वज्ञान समजण्यास युरोपच्या अर्वाचीन काळच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाची थोडीशी तरी माहिती असणे अवश्य आहे. तरी या तत्त्वज्ञानाचे येथें किंचित् सिंहावलोकन करूं.

{{gap}}युरोपांतल्या अर्वाचीन युगाला, विद्येच्या पुनरुज्जीवनापासून सुरवात झाली. त्या पूर्वीच्या काळाला मध्ययुग किंवा अज्ञानयुग म्हणतात. या विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या योगें युरोपांत सर्व शास्त्रांची झपाट्याने प्रगति होऊ लागली, त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाचाही उद्भव झाला. मनुष्याला ज्ञान मिळणे शक्य आहे काय ? हाच तत्त्वज्ञानाचा मुख्य प्रश्न पुढे आला. कारण मध्ययुगीन कल्पनेप्रमाणे बायबल व मान्य केलेले इतर ग्रंथ यांपलीकडे ज्ञानच नाही; मानवी बुद्धीचे काम म्हणजे या ग्रंथांचे विवेचन करणे इतकेच आहे; मानवी बुद्धीला नवीन ज्ञान होणे शक्य नाही, अशी मध्ययुगीन लोकांची समजूत होती. विद्येच्या पुनरुज्जीवनाने या समजुतीला जबरदस्त धक्का बसला व म्हणूनच मानवी ज्ञानाचा प्रश्न<noinclude>{{center|९५}}</noinclude>
k7c7pvwiyou7vlop55l67vevtjm5z3a
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०२
104
110353
230014
2026-05-16T11:12:50Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "महत्त्वाचा बनला. या मानवी ज्ञानाची मीमांसा बेकन व डेकार्ट या दोन तत्त्वज्ञान्यांनी निरनिराळ्या तऱ्हेने केली.
{{gap}}बेकन संवेदनावादाचा जनक बनला. त्याचे मते मनुष्याचे सर्व ज्ञान..."
230014
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>महत्त्वाचा बनला. या मानवी ज्ञानाची मीमांसा बेकन व डेकार्ट या दोन तत्त्वज्ञान्यांनी निरनिराळ्या तऱ्हेने केली.

{{gap}}बेकन संवेदनावादाचा जनक बनला. त्याचे मते मनुष्याचे सर्व ज्ञान त्याला इंद्रियद्वारा होतें, बाह्य पदार्थाचे प्रतिबिंब आपल्या इंद्रियांवर पडते. इंद्रिये मनावर संवेदना उत्पन्न करतात व या संवेदनांनी सत्य ज्ञान होते. मानवी मन हे आरशासारखे आहे. आरसा ज्याप्रमाणे स्वच्छ व मलरहित असला म्हणजे त्यावर पदार्थाचें प्रतिबिंब यथार्य उठते, त्याचप्रमाणे मनामध्ये पूर्वग्रह-कल्पनाशक्तीने किंवा केवल विवेकाने उभारलेले विचार-नसले म्हणजे संवेदनांचा ठसा मनावर यथार्थ उमटतो. तरी सृष्टिज्ञानाला शुद्ध व निर्विचार मन पाहिजे. मानवी कल्पना शक्तीने व विवेकशक्तीने उत्पन्न केलेले विचार हे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आहेत, असे बेकनने म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे कोळी आपल्याच अंगापासून चीक काढून त्याच्या धाग्याचे सुंदर जाळे बनवितो, पण ते एका फुकरासरसें तुटून जाते, त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीने व केवळ विवेकशक्तीने उभारलेले विचारांचे डोलारे अनुभवाने मोडले जातात, सारांश, बेकनच्या मते मानवी मनाची संवेदनशक्ति हीच खरें ज्ञान देणारी शक्ति होय. कल्पनाशक्ति व विवेकशक्ति या ज्ञानाभास देणाऱ्या शक्ति होत. तरी मनुष्यांनी पहिल्या शक्तीवर विसंबले पाहिजे; तर मनुष्याला सत्यज्ञान होईल. या मताच्या योगे बेकन हा संवेदनावादाचा जनक बनला.

{{gap}}डेकार्ट या फ्रेंच तत्त्वज्ञ न्याने दुसराच पंथ काढला, मला कोणत्या गोष्टीचे खात्रीचे ज्ञान आहे ? या प्रश्नापासून त्याने तत्त्वज्ञानाला सुरवात केली. त्याचे मते आपली इंद्रिये आपल्याला फसवितात; कारण ती पुष्कळ वेळां ज्ञानाचा आभास मनांत उत्पन्न करतात. आपल्याला दृष्टिभ्रम होतो, श्रुतिभ्रम होतो. तेव्हां बाह्य सृष्टीचे खरे ज्ञान आपल्याला होत नाही. तसेंच गणितशास्त्रांतील प्रमेयें तरी खरी कशावरून असा आपल्याला संशय येतो. सारांश; ज्ञानासंबंधी आपण विचार करू लागलों म्हणजे 'मला सर्व गोष्टींबद्दल संदेह वाटतो' अशा विधानाला आपण येऊन पोचतो.{{nop}}<noinclude>{{center|९६}}</noinclude>
esftsm8a804ombs8qhzwe7ynzcjya57
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०३
104
110354
230015
2026-05-16T11:13:35Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "पण या संदेहात्मक विधानांत एका पदार्थाबद्दल संदेह राहत नाही. तो पदार्थ म्हणजे अहंभावरूप आत्मा अगर मन. संदेह वाटण्याला सुद्धा 'संदेही' अस्तित्वांत पाहिजे. तेव्हां ' मी विचार करतो म..."
230015
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>पण या संदेहात्मक विधानांत एका पदार्थाबद्दल संदेह राहत नाही. तो पदार्थ म्हणजे अहंभावरूप आत्मा अगर मन. संदेह वाटण्याला सुद्धा 'संदेही' अस्तित्वांत पाहिजे. तेव्हां ' मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वांत आहे ' हे मोठे प्रमेय या संदेहपद्धतींतून निघते. अहंभावाची जाणीव असलेल्या आत्म्याच्या अस्त्विाबद्दलचे पहिले सय आपल्याला निश्चितपणे कळतें. आतां या सत्यापासून आणखी सत्ये निष्पन्न होतात. आत्म्याच्या संदेहवृत्तीपासून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होते. पण संदेहवृत्ति-आत्मा म्हणजे अपूर्ण सदोष आत्मा होय. पण अपूर्ण व सदोष आत्मा ही कल्पना सापेक्ष आहे. ती कळण्याकरता 'संपूर्ण व दोषरहित आत्मा' ही कल्पना कळावीच लागते. पण ही दुसरी कल्पना म्हणजेच सर्वगुणसंपन्न परमेश्वराची कल्पना होय. तेव्हां जीवात्मा व परमात्मा अशा दोन कल्पना आपल्याला कळल्या. त्यांपैकी जीवात्म्याच्या अस्तित्वाची खात्री झालीच आहे. आतां परमात्म्याच्या अस्तित्वाची खात्री खालील प्रमाणाने पटते. सर्वगुणसंपन्न परमात्मा आस्तत्वात असलाच पाहिजे. कारण जर तो अस्तित्वांत नसेल तर तो सर्वगुणसंपन्न होणार नाही. कारण अस्तित्व हा गुण त्याच्यामध्ये नाही असे होईल. या विचारसरणीने सृष्टीतील दोन पदार्थ सिद्ध झाले. आतां राहिली बाह्य सृष्टि. हिचे अस्तित्वही सिद्ध करता येते. परमात्मा सर्वगुणसंपन्न आहे. या गुणांमध्ये 'सचोटी' हा गुण येतो. तेव्हां सर्वगुणसंपन्न परमेश्वर दुसऱ्यास फसविणार नाही. म्हणूनच आपल्या इंद्रियांना ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्या सयमय असल्या पाहिजेत. नाही तर परमेश्वराने आपल्याला भ्रमविणारी इंद्रिये देऊन फसविले असे होईल. याप्रमाणे तत्त्वज्ञानाचे तीन पदार्थ सिद्ध झाले. जीवात्मा, परमात्मा व जड सृष्टि परमात्मा हा पूर्ण असून त्यानेच जीवात्मे व जड सृष्टि निर्माण केली. जीवात्मे व जड सष्टि यांचे गुण परस्परविरोधी आहेत. जीवात्मा विवेकवान् व अवकाशरहित पदार्थ आहे तर जड सृष्टि ही विवेकरहित व अवकाश व्यापणारी आहे. याप्रमाणे डेकार्टचे तत्त्वश्पन आहे. या तत्त्व-<noinclude>{{center|९७}}</noinclude>
sjzllh8i15vm4cuzg0ak1fnut9kkg0x
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०४
104
110355
230016
2026-05-16T11:14:18Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ज्ञानाचा विशेष म्हणजे त्यांत मानवी मनाच्या विवेकावर सर्व भर टाकलेला आहे. म्हणूनच डेकार्ट हा विवेकवादाचा जनक बनला.
{{gap}}डेकार्टचे तत्त्वज्ञान स्पायनोझा याने परिपूर्णतेस आणिले..."
230016
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>ज्ञानाचा विशेष म्हणजे त्यांत मानवी मनाच्या विवेकावर सर्व भर टाकलेला आहे. म्हणूनच डेकार्ट हा विवेकवादाचा जनक बनला.

{{gap}}डेकार्टचे तत्त्वज्ञान स्पायनोझा याने परिपूर्णतेस आणिलें. साधारणतः यासारख्याच मतांचा पुरस्कार लायबनिट्स या जर्मन तत्त्वज्ञान्याने केला व लायवनिटझच्या मतांचा व्यवस्थित संग्रह वुल्फ या तत्त्वज्ञान्याने केला व हेच तत्त्वज्ञान कँटच्या काळी जर्मन युनिव्हर्सिटींत प्रचलित होते. हे मागे एकदां सांगितलेच आहे.

{{gap}}बेकनने प्रारंभ केलेल्या संवेदनावादाकडे आता वळणे जरूर आहे. बेकन हा तत्त्वज्ञानी म्हणून फारसा प्रसिद्ध नाही. संवेदनावादाचा खरा पुरस्कर्ता लॉक हा इंग्रज तत्त्वज्ञानी होय. त्याने सर्व ज्ञान संवेदनांनी मिळते असे प्रतिपादन केले. विवेकशक्तीचाही त्याने उल्लेख केला आहे. पण ज्ञानाच्या बाबतीत विवेकाचे काम गौण आहे असे त्याचे म्हणणे आहे. सर्व ज्ञानाचें मूळ संवेदनांत आहे. संवेदनांनी काही ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाच्या संयोगाने आणखी ज्ञान विवेकाला काढता येईल. पण सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे असे लोकचे म्हणणे आहे. त्याचे मतें प्रारंभी मानवी मन कोऱ्या कागदासारखे असते. त्यावर संवेदनांनीच प्रथमतः संस्कार होतात व त्यांपासून मग पुढे विचार बनतात. डेकार्टप्रमाणे लॉकही सृष्टीत तीन पदार्थ आहेत असे मानीत असे. इंद्रियांनी दिलेल्या संवेदनांनी आपल्याला बाह्य सृष्टि कळते. म्हणजे बाह्य सृष्टीचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे. आत्म्याचे ज्ञान आपल्या सर्व जाणीवेत व संवेदनांत प्रतीत होते असे डेकाटप्रमाणेच लाक म्हणे. ईश्वराचे ज्ञान आपल्याला अनुमानाने होते असे तो म्हणे; ते येणेप्रमाणे:--

{{gap}}ही सृष्टि व मानवी प्राणी ही कार्ये होत. आतां या कार्याना कोणी तरी कर्ता पाहिजे व तो कर्ता सर्वशक्तिमान व सर्वज्ञ असा असला पाहिजे. तो अर्थात् परमेश्वरच होय. लॉकच्या पुढची संवेदनवादाची पायरी बार्क्लेनें गांठलो. त्याने तर सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे व म्हणून बाह्य जगच मुळीं मानतां येत नाही असे दाखविले. पण या पुस्तकांत<noinclude>{{center|९८}}</noinclude>
igpoy8bslbkr1gd6k1g7vqb6vuvhlxj
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०५
104
110356
230017
2026-05-16T11:15:04Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "बाक्लेंच्या तत्वज्ञानाची हकीकत आलीच आहे. तेव्हां त्याची येथे घुनरावृत्ति करण्याचे कारण नाही.
{{gap}}ह्यूमने संवेदनावादाचा अंत संशयवादांत कसा होतो हे स्पष्ट करून दाखविले. त्याने..."
230017
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>बाक्लेंच्या तत्वज्ञानाची हकीकत आलीच आहे. तेव्हां त्याची येथे घुनरावृत्ति करण्याचे कारण नाही.

{{gap}}ह्यूमने संवेदनावादाचा अंत संशयवादांत कसा होतो हे स्पष्ट करून दाखविले. त्याने प्रथमतः तीन पदार्थाबद्दल संशय प्रदर्शित केला. त्याचे म्हणणे हे की, बार्क्लेने दाखविलेल्या ज्या कारणाकरितां आपल्याला जड सृष्टीचे अस्तित्व मानतां येत नाही त्याच कारणाकरितां आत्मा व परमात्मा यांचेही अस्तित्व मानतां येत नाही. कारण संवेदनांच्या मागे काही तरी 'जड पदार्थ' आहे असे आपल्याला सांगता येत नाही, तर मनाच्या संवेदना, कल्पना, विचार, वासना व विकार-मनाचे सर्व व्यापार यांच्या मागें आत्मा आहे असें तरी कसे सांगतां येईल ? व जड सृष्टि व आत्मा हे पदार्थ संशयास्पद ठरल्यावर परमात्मा या पदार्थाच्या अस्तित्वाला तरी आधार काय ? तोही संशयास्पद ठरतो.

{{gap}}याप्रमाणे ह्यूमने तत्त्वज्ञानाच्या पदार्थत्रयावर घाला घातला. पण तो येथेच थांबला नाही. आधिभौतिक शास्त्राचा पाया जी 'कार्यकारणाची कल्पना' त्या कल्पनेवर ह्यूमने घाव घालण्यास सुरवात केली. बेकन, लॉक किंवा बार्ले या संवेदनावादी तत्त्वज्ञान्यांनी कार्यकारणभावाची कल्पना गृहीतच धरली होती. लॉकच्या मते ती कल्पना आपल्या इतर शास्त्रीय कल्पनांप्रमाणे आपल्याला अनुभवाने--संवेदनांनी कळते. येथेच यूमने लॉकची घोडचूक दाखविली. झूमचे म्हणणे असे की, कार्यकारण भावाचा विचार ही कल्पनाशक्तीची भ्रांति आहे. ती संवेदनांनी समजणे शक्यच नाही. कारण, संवेदना एकामागून येतात, एवढेच संवेदना सांगू शकते; एक बिलियर्ड गोटी हालल्यानंतर दुसरी हलते, उष्णतेची संवेदना झाल्यावर भाजल्याची संवेदना होते. पण एक गोटी दुसऱ्या गोटीच्या गतीचे कारण हे काही आपण पहात नाही. तसेच उष्णता हे भाजल्याचे कारण हे कांही आपण पहात नाही. उष्णता व भाजणे ही पुष्कळ वेळां एका मागून एक आली म्हणजे आपल्याला त्यामध्ये जास्त निकट संबंध आहे असा नुसता भा होतो; परंतु संवेदनांमध्ये निकट<noinclude>{{center|९९}}</noinclude>
nt3lxwbqufdjsxrl6sgubrb6zheq1rp
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०६
104
110357
230018
2026-05-16T11:15:43Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "संबंध उत्पन्न होत नाही; तर जो कल्पनासंगतीच्या तत्वानुरूप आपल्या केवळ मनांत उत्पन्न होतो. तेव्हां आपल्याला संवेदनांनी जे बाह्य सृष्टीचे ज्ञान होते ते अगदी विस्कळीत असते. त्यांत..."
230018
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>संबंध उत्पन्न होत नाही; तर जो कल्पनासंगतीच्या तत्वानुरूप आपल्या केवळ मनांत उत्पन्न होतो. तेव्हां आपल्याला संवेदनांनी जे बाह्य सृष्टीचे ज्ञान होते ते अगदी विस्कळीत असते. त्यांत संबंधकल्पना येत नाही. म्हणून कार्यकारणाची भावना हा निवळ मानवी कल्पनेचा भ्रम आहे. त्यांत सत्यांश मुळीच नाही. याप्रमाणे ह्यूमने कार्यकारण भावाच्या कल्पनेवर घाला घातला व ती कल्पना भ्रममूलक आहे असे दाखविले. या योगें कार्यकारण भावाच्या तत्वावर उभारलेली सर्व आधिभौतिक शास्त्रांची इमारत पार ढासळली. ह्यूमच्या मताप्रमाणे पदार्थत्रय संशयास्पद झाले; कार्यकारणभाव भ्रमरूप झाला. अर्थात् शास्त्राचा सर्व पायाच गेला व अशा तऱ्हेनें ह्यूमने संवेदनावादाचा संशयवादांत शेवट करून दाखविला.

{{gap}}मानवी मनाला ज्ञान असाध्य आहे व म्हणूनच संशयवाद खरा ही कल्पना कँटच्या मनाला मुळीच सहन होईना. तरुण वयापासून त्याचा सर्व भर आधिभौतिक शास्त्रांवर, ती शास्त्रेही ह्युमच्या तत्वज्ञानाने जेव्हां विलयास जाऊ लागली, तेव्हां कॅटचे मन गोंधळून गेले. त्याची मनोदेवता त्याला सांग की गणित व भौतिक शास्त्र या द्वयीमध्ये तरी सत्य ज्ञान आहे खास. पण तत्वज्ञानाच्या पंथाप्रमाणे तर या नावर पाणी सोडण्याची पाळी आली. तरी पूर्वीच्या तत्वज्ञानाची कोठे तरी भयंकर भूल होत असली पाहिजे असे कॅटच्या मनाने घेतले. व म्हणूनच त्याने तत्वज्ञानाचा प्रश्न मूळापासून स्वतंत्रपणे सोडविण्याचा निश्चय केला व त्या निश्चयाचे फळ म्हणजेच कॅटचे परिक्षणात्मक तत्वज्ञान होय. तेव्हां आतां त्या कॅटच्या तत्वज्ञानाकडेच आपण वळणे बरे.<noinclude>{{center|१००}}</noinclude>
teaqtiwkjkfz6j2vtoxstrbx2gqvfdb
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०७
104
110358
230019
2026-05-16T11:16:22Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{center|(३)}} {{center|{{xx-larger|'''कँटचे तत्त्वज्ञान.'''}}}}
{{gap}}पूर्वीच्या सर्व तत्वज्ञानापासून आपल्या तत्त्वज्ञानाचा फरक दाखविण्याकरतां कँटने आपल्या तत्वज्ञानाला परीक्षणात्मक तत्वज्ञान' असें न..."
230019
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{center|(३)}}
{{center|{{xx-larger|'''कँटचे तत्त्वज्ञान.'''}}}}

{{gap}}पूर्वीच्या सर्व तत्वज्ञानापासून आपल्या तत्त्वज्ञानाचा फरक दाखविण्याकरतां कँटने आपल्या तत्वज्ञानाला परीक्षणात्मक तत्वज्ञान' असें नवीन नांव दिले आहे व ते त्याने तीन ग्रंथांत ग्रथित केले आहे. या ग्रंथांची नांवेंही दुर्बोध अशी आहेत. प्रथमतः त्याने 'शुद्ध विवेकाचे परीक्षण' या नांवाचा ग्रंथ लिहिला. हाच त्याच्या तत्वज्ञानाचा मुळ ग्रंथ होय. यामध्ये कॅटने आपली नवी ज्ञानमीमांसा इचे विवेचन केले. नंतर त्याने 'सदसद्विवेकाचे परीक्षण' म्हणून दुसरा ग्रंथ लिहिला. यांत त्याचे नीतिशास्त्रविषयक विचार आलेले आहेत. शेवटी त्याने 'भावनेचे परीक्षण, · नांवाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कॅटच्या तत्वज्ञानरूपी कमानीचा जणू कांही मधला चिराच आहे. यामध्ये आपल्या पहिल्या दोन ग्रंथांतील विचारांचा मेळ घालून कँटने त्यावर नवीन विचारांचा मुगुटमणी चढविला आहे. हे तीन ग्रंय म्हणजे मानवी मनाच्या तीन प्रमुख शक्ति-विवेकशक्ति, इच्छाशक्ति व भावनाशक्ती-यांचे विवेचन आहे असे म्हटले तरी चालेल. आतां क्रमाने या तीन ग्रंथांचे थोडक्यांत सार सांगू या.

{{gap}}कँटने कॉलेजांत असतांनाच वुल्फच्या विवेकवादी तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. या मताचे म्हणणे हे की, सर्व मानवी शान विवेकानें होते. पण त्याच वेळी विवेकशक्तीचा कमतरपणा कॅटच्या मनांत आला होता. विवेकशक्ति ही पृथक्करणात्मक शक्ति आहे; ती विधायक शक्ति नाहीं. विवेक विचारांचे पृथकरण करून त्यांतून अनुमानाने सिद्धांत काढील. परंतु विवेकानें नवीन न कधीही होणार नाही. विवेकाला प्रथमतः पूष्कळसे सिद्धांत गृहीत धरावे लागतात व त्या सिद्धांतांच्या साहाय्याने<noinclude>{{center|१०१}}</noinclude>
aijp1lf197oak9wfb55vwhgep1pawde
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०८
104
110359
230021
2026-05-16T11:16:58Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "उपसिद्धांत विवेक काढतो. तेव्हां सर्व ज्ञान विवेकानें होते हे म्हणणे बरोबर नाही असें कैंटला वाटत असे. त्या वेळी हे गृहीत धरलेले सिद्धांत अनुभवाने कळतात असें त्याला वाटे, पण ह्यूम..."
230021
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>उपसिद्धांत विवेक काढतो. तेव्हां सर्व ज्ञान विवेकानें होते हे म्हणणे बरोबर नाही असें कैंटला वाटत असे. त्या वेळी हे गृहीत धरलेले सिद्धांत अनुभवाने कळतात असें त्याला वाटे, पण ह्यूमनें अनुभवाने सिद्धांत निघत नाहीत असे दाखविण्याचा प्रयत्न केला. याप्रमाणे सर्व ज्ञान संशवास्पद होऊ लागले. म्हणूनच कँटनें मानवी ज्ञान कसें होतें हाच प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे त्याने चार विभाग केले व आपल्या ग्रंथांच्या चार भागांत त्यांचे विवेचन केले. मानवी शानाचे स्थूल मानाने तीन शास्त्रांमध्ये वर्गीकरण करता येते. गणित, आधिभौतिक शास्त्रे किंवा सृष्टिशास्त्र आणि तत्वज्ञान, गणित व सृष्टिशास्त्रे ही अस्तित्वांत असून त्यांची सारखी प्रगति होत आहे ही निर्विवाद गोष्ट आहे असें कँटचे म्हणणे होते. तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दल मात्र शंका आहे. कारण त्यांत सर्वसंमत अशी प्रमेयेंच दृष्टीस पडत नाहीत. म्हणून विचार करावयाचे हे होत.

{{Block center|<poem>१ गणितशास्त्र का व कसे शक्य आहे ?
२ सृष्टि शास्त्र का व कसे शक्य आहे?
३ तत्त्वज्ञान शक्य आहे का ? व शक्य नसल्यास मानवी मनाची
तत्त्वज्ञानविषयक स्वाभाविक प्रवृत्ति का आहे?
४ कोणत्या पायावर नवीन तत्वज्ञान बनविता येईल.?</poem>}}
{{gap}}कॅटच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथांत या चार प्रश्नांची चार भागांत उत्तरें आलेली आहेत. ही उत्तरे देतांना कॅटच्या मनापुढे विवेकवाद व संवेदनावाद हे एकांगीवाद सारखे आहेत व त्यांना उद्देशूनच जणू काही कँटने या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याचा प्रथमतः ओढा संवेदनावादाकडे होता व म्हणून त्या वादाच्या म्हणण्यापासून सुरवात करून कॅटनें त्या वादाचा कमतरपणा दाखवून हळुहळू आपल्या परीक्षणात्मक तत्वज्ञानाकडे वाचकांना ओढीत नेलें आहे.

{{gap}}सर्व मानवी ज्ञानाला संवेदनांपासून सुरवात होते हे खरे आहे. पण त्यावरून सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे हे मात्र खरे नाही. संवेदना ही<noinclude>{{center|१०२}}</noinclude>
9hryyzqbirz0hl95l3z2c8tqlslejf8
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०९
104
110360
230022
2026-05-16T11:17:49Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ज्ञानाचे एक अंग आहे. त्या अंगाला बुद्धीच्या व्यापाराची जोड झाल्या खेरीज त्याला ज्ञानरूप प्राप्त होत नाही. तेव्हां बुद्धीचे अंग ज्ञानाला आवश्यक आहे व ज्ञान हे संवेदना व विचार (बु..."
230022
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>ज्ञानाचे एक अंग आहे. त्या अंगाला बुद्धीच्या व्यापाराची जोड झाल्या खेरीज त्याला ज्ञानरूप प्राप्त होत नाही. तेव्हां बुद्धीचे अंग ज्ञानाला आवश्यक आहे व ज्ञान हे संवेदना व विचार (बुद्धीचे कार्य) यांच्या संयोगापासून होते असे कँटने प्रतिपादन केले आहे व प्रथमतः संवेदनांत बुद्धीचा अंश कसा आहे हे पहिल्या भागांत दाखवून दिले आहे.

{{gap}}बाह्य पदार्थोपासून इंद्रियद्वारा आपल्याला संवेदना होतात असे आपण म्हणतो. या संवेदना एकसमयावच्छेदेंकरून किंवा एकामागून एक अशा आपल्या मनावर येतात. तसेच त्या बाहेरून,दुरून,जवळून, मागून, पुढून, खालून, वरून, उजवीकडून, डावीकडून येतात. आतां एकसमयावच्छेदकता व आनुपूर्य यांमध्ये काळाची कल्पना अन्तर्भूत झालेली आहे व बाह्यता यामध्ये अवकाश, दिशा या कल्पनेचा अन्तर्भाव झालेला आहे. म्हणजे दिक् व काल या संवेदना नव्हत, तर संवेदना मानवी मनाला मिळण्याच्या या अटी आहेत. जर मानवी मनाला संवेदना व्हायच्या असतील तर त्या अवकाश व काल याशिवाय होणार नाहीत. अवकाश व काल ही जणूं कांही मानवी मनाने उत्पन्न केलेली वस्तूंची आवरणे होत. बाह्य वस्तूचे ज्ञान या आवरणांतूनच आपल्याला व्हावे अशीच आपल्या मनाची घटना आहे. म्हणजे अवकाश व काल या संवेदना नव्हत. कारण संवेदना भासण्यास त्यांची जरूरी आहे व त्या वाह्य वस्तुही नव्हत. कारण त्या सर्वव्यापी आहेत तेव्हां अवकाश व काल ही मानवी बुद्धीचा मानवी ज्ञानाला लागणारा वाटा आहे. आतां गणितशास्त्र, अवकाश काल व (पुढे विवेचन करावयाची कल्पना संख्या व परिमाण) संख्या या गुणत्रयीचे शास्त्र आहे हे सर्वसंमत आहे. या शास्त्रांत नवी नवी सत्ये व सिद्धांत आपण सिद्ध करतो तें अनुभवाने किंवा प्रयोगाने करीत नाही तर तें विवेकाने एका खोलीत बसून सिद्ध करतो; तरी पण हे आपल्या विवेकाने सिद्ध केलेले सिद्धांत सर्व ज्ञात-अज्ञात बाह्य सृष्टीतील पदार्थाना लागू असले पाहिजेत, असे आपण खात्रीने सांगू शकतो. सारांश, गणितशास्त्र शक्य आहे. कारण जरी ते केवळ विवेकाने सिद्ध केले जाते,<noinclude>{{center|१०३}}</noinclude>
dhiybpm9xa5kx37i73b7xrrck2qepi4
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११०
104
110361
230023
2026-05-16T11:18:28Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तरी गणितशास्त्राचे विषय मुळी मानवी मनाने संवेदनांस दिलेले असल्या मुळे गणिताचे सिद्धांत सर्व पदार्थमात्राला लागू आहेत.
{{gap}}याच्या पुढल्या प्रश्नाच्या उत्तराकरितां कँटने ज्ञ..."
230023
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तरी गणितशास्त्राचे विषय मुळी मानवी मनाने संवेदनांस दिलेले असल्या मुळे गणिताचे सिद्धांत सर्व पदार्थमात्राला लागू आहेत.

{{gap}}याच्या पुढल्या प्रश्नाच्या उत्तराकरितां कँटने ज्ञानाचे जास्त पृथक्करण केले आहे. आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्या विस्कळीत कल्पना नव्हेत. ज्ञान हे दोन कल्पनांच्या संयोगाने होते, म्हणजे ज्ञान हे विधानाच्या योगें होतें. आतां ह्यूमने म्हटल्याप्रमाणे संवेदना तर विस्कळीत व एकापासून एक दूर अशा असतात, न्यांत संबंध दिसून येत नाही. सर्व ज्ञान तर संबंधमय असते. तेव्हां ज्ञानांत हे संबंध कसे उत्पन्न होतात ? तर बुद्धि आपल्या काही स्वयंसिद्ध कल्पनांनी हे संबंध उत्पन्न करते व ज्या अर्थी विधाने बुद्धीने केली जातात त्या अर्थी तर्कशास्त्र ने केलेल्या विधानांच्या वर्गीकरणाकडे पाहिले म्हणजे ज्ञानामध्ये बुद्धीचा अंश किती हे तेव्हांच कळून येईल. कँटनें विधानाच्या वर्गीकरणावरून व पृथक्करणावरून खालील कल्पना ज्ञानामध्ये अन्तर्भूत होतात असे काढले आहे.

{{Block center|<poem>संख्यची कल्पना १ एकत्व, बहुत्व व एकूणत्व,
गुणाची कल्पना १ अस्तित्व, नास्तित्व व आस्तित्वनास्तित्व
संबंधाची कल्पना १ पदार्थाची शाश्वतता, २ कार्यकारणभाव ३ अन्योन्याश्रयभाव.
संभवनीयतेची कल्पना २ शक्यता व अशक्यता, २ प्रत्यक्षता, अप्रत्यक्षता ३ अवश्यकता व संभवनीयता..</poem>}}
{{gap}}विस्कळीत संवेदनांना ज्ञानात्मक स्वरूप येण्यास या सर्व कल्पना अवश्यक आहेत. व या विशिष्ट कल्पनांशिवाय आणखी सर्व ज्ञानांत एक सामान्य कल्पना अन्तर्भत झालेली असते; ती कल्पना म्हणजे त्याची होय. सर्व संवेदनाचे एकीकरण व्हावयास या सर्व कल्पना मी अनुभवीत आहे अशी आत्म्याची जाणीव लागते. त्याखेरीज संबद्ध असें ज्ञानच शक्य नाही. तरी आतां पूर्वीच्या विवेचनाचा संग्रह करून मानवी ज्ञानाचे अवयव कोणते ठरतात ते पाहू या.

{{gap}}ज्ञान होण्यास प्रथमतः संवेदना पाहिजेत हे उघड आहे. संवेदनां<noinclude>{{center|१०४}}</noinclude>
okmr29n6buzwk5u8hxx3i2dqsil8eq0
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१११
104
110362
230024
2026-05-16T11:19:07Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "खेरीज ज्ञानाला प्रारंभच होणार नाही. तेव्हां मानवी ज्ञानाचे पहिले अग संवेदना होत; पण या संवेदना अवकाश व काल यांखेरीज शक्य नाहीत; म्हणून अवकाश व काल हीही ज्ञानाची अंगें होत. शिवाय ज..."
230024
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>खेरीज ज्ञानाला प्रारंभच होणार नाही. तेव्हां मानवी ज्ञानाचे पहिले अग संवेदना होत; पण या संवेदना अवकाश व काल यांखेरीज शक्य नाहीत; म्हणून अवकाश व काल हीही ज्ञानाची अंगें होत. शिवाय ज्ञानाला एकत्व किंवा संबद्धत्व आणणाऱ्या कल्पना म्हणजे संख्या, गुण, संबंध व संभवनीयता या होत व या सर्वांच्या मूळाशी आत्म्याच्या जाणीवेची कल्पना. कोणतेही ज्ञान तुम्ही घ्या; त्यांत या सर्व अंगांचा अन्तर्भाव झालेला आहे असे आपल्यास दिसून येईल. एका दाखल्याने हे स्पष्ट करता येईल, समजा एखादा मनुष्य गाढ निद्रेतून जागा झाला तर प्रथमतः त्याच्या मनावर त्याच्या इंद्रियांकडून संवेदनांचा जणू काही मारा होईल, या सर्व संवेदनांचा त्याच्या मनांत घोटाळा माजलेला असेल. मला संवेदना होत आहेत येवढेच आधी त्याला कळेल. व बुद्धीच्या व्यापाराच्या योगे या सर्व विस्कळीत व म्हणूनच संदिग्ध संवेदनांचे बुद्धीने दिलेल्या स्वयंसिद्ध कल्पनांनुरूप वर्गीकरण होईल व त्या संवेदनांना स्पष्ट व सविकल्प ज्ञानाचे स्वरूप प्राप्त होईल. हे सर्व परिवर्तन मानवी मनाला न कळत अशा तऱ्हेने मनांत होत असते व मगच मानवी ज्ञान तयार होते. म्हणजे संवेदनारूपी ज्ञानाच्या कच्च्या मालावर बुद्धीचे व्यापार घडून ज्ञानरूपी पक्का माल तयार होतो असें उपमेने सांगतां येते.

{{gap}}थोडक्यांत कँटची शानमीमांसा वरील तऱ्हेची आहे.त्याने संवेदनावादी व विवेकवादी ह्या दोघां तत्वज्ञांची ज्ञानमीमांसा कशी एकतर्फी व म्हणून चुकीची आहे हे आपल्या नव्या परीक्षणात्मक तत्वज्ञानांत दाखविलें आहे. कँटच्या मताप्रमाणे मानवी ज्ञानाला खालील गोष्टी अवश्यक आहेत.

{{gap}}६ संवेदना.

{{gap}}२ अवकाश व काल.

{{gap}}३संख्या,परिमाण,भावरूपी व अभावरूपी गुण, कार्यकारणभाव, अन्योन्याश्रयभाव, पदार्थाचे अविनाशित्व व शक्याशक्यता वगैरे बारा स्वसंसिद्ध कल्पना.

{{gap}}४ सर्व ज्ञानाला एकसूत्रता आणणारी आत्म्याची जाणीव.
<noinclude>{{center|१०५}}</noinclude>
n1qj3zpfxs8aec0jyru6fpygvjx69ij
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११२
104
110363
230025
2026-05-16T11:19:53Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{gap}}वर दिल्याप्रमाणे थोडक्यांत कॅटची मानवी ज्ञानाची मीमांसा आहे. तिचा विशेष हा होय की, संवेदनावादी व विवेकवादी या दोन्ही पंथांच्या तत्त्वज्ञान्यांच्या मतांतील सत्याच्या अंशाच..."
230025
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{gap}}वर दिल्याप्रमाणे थोडक्यांत कॅटची मानवी ज्ञानाची मीमांसा आहे. तिचा विशेष हा होय की, संवेदनावादी व विवेकवादी या दोन्ही पंथांच्या तत्त्वज्ञान्यांच्या मतांतील सत्याच्या अंशाचा अंतर्भाव कँटने आपल्या मीमांसेंत केला आहे. संवेदना व विवेक या दोन्हीहि शक्ति मानवी ज्ञानाला आवश्यक आहेत असे त्याने प्रतिपादन केले आहे. व या मीमांसेच्या योगाने त्याने आधिभौतिक शास्त्रांची शक्यता शाबीत केली आहे. आधिभौतिक शास्त्रे गणितशास्त्राप्रमाणे काही तत्वें स्वयंसिद्ध अशी धरतात व त्या तत्वांवरच सर्व आधिभौतिक शास्त्रे अवलंबून आहेत. पण ही तत्वे मानवी ज्ञानाला विवेकज्ञानमीमांसेंत अंतर्भूत झालेल्या कल्पनांच्या द्वारेंच होतात. उ० सर्व ज्ञेय पदार्थाना अवकाश, काल, संख्या व परिमाण हे गुण असतात व म्हणूनच सर्व बाह्य ज्ञेय पदार्थ हे सावयव असून ते विभागतां येतात. आतां आधिभौतिक शास्त्रांतले हे गृहीत तत्त्व ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते हे उघड आहे. तसेच सर्व वाह्य ज्ञेय पदार्थाना कमीअधिक होणारे सांश गुण आहेत हे तत्त्व सुद्धा ज्ञानाच्या अटीपासून निष्पन्न होते. त्याप्रमाणेच प्रत्येक ज्ञेय वस्तु ही काही तरी कारणाचे कार्य असते हे तत्व सुद्धां ज्ञानाच्या अटीपासूनच निष्पन्न होते. तसेच बाप सृष्टि ज्या जड द्रव्याने बनलेली आहे तें जड तत्व अविनाशी आहे, त्याची जगांत नवी वाढ होत नाही किंवा त्याचा जगांत नाशही कधी होत नाही हे तत्व ज्ञानाच्या अटींतून निष्पन्न होते. सारांश, कटच्या मताने त्याची एकदां ज्ञानमीमांसा गृहीत केली की, आधिभौतिक शास्त्रांचे त्यायोगें समर्थन होतें व मची मानवी ज्ञानाबद्दलची व विशेषतः आधिभौतिक शास्त्राच्या शक्यतेची कुशंका नष्ट होते.

{{gap}}येथपर्यंत गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांची शक्यता शाबीत करून ह्यूमची चूक कँटने दाखवून दिली. त्याच्या पुस्तकाच्या पुढल्या भागांत मात्र ह्यूमचें व कॅटचे एकमत असून त्यांत त्याने विवेकवादी तत्वज्ञान्यांचे तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दलचे मत खोडून काढले आहे क अशेयवाद स्थापित केला आहे. विवेकवादी तत्वज्ञान्यांच्या मताने आप<noinclude>{{center|१०६}}</noinclude>
aolvfew2ftsepzl8n4aes1my566dzd2
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११३
104
110364
230026
2026-05-16T11:20:43Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ल्याला तत्वज्ञान साध्य आहे. त्यांने मताप्रमाणे तत्वज्ञानाचे प्रश्न तीन. आत्म्याचे अस्तित्व व अमरत्व या बद्दलचा पहिला प्रश्न, सृष्टीचे यथार्थ व केवल स्वरूप याबद्दलचा दुसरा प्र..."
230026
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>ल्याला तत्वज्ञान साध्य आहे. त्यांने मताप्रमाणे तत्वज्ञानाचे प्रश्न तीन. आत्म्याचे अस्तित्व व अमरत्व या बद्दलचा पहिला प्रश्न, सृष्टीचे यथार्थ व केवल स्वरूप याबद्दलचा दुसरा प्रश्न व परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा तिसरा प्रश्न. हे तिन्ही प्रश्न आपल्या केवल विवेकाने सोडवितां येतात, असें विवेकवादीपंथाचे मत होते. कँटने असे दाखवून दिले की, विवेकवादी यांच्या यासंबंधीच्या विवेचनांत घोडचुका आहेत. व या वस्तूंचे ज्ञान मानवी मनाला होणे शक्य नाही व म्हणून मानवी बुद्धीच्या द्वारे तरी हे पदार्थ अज्ञेय आहेत.

{{gap}}प्रथमतः आत्म्याच्या आस्तत्वाचा प्रश्न घ्या. आत्म्याची कल्पना आपल्या ज्ञान ला आवश्यक आहे हे कॅटला कबूल आहे सर्व ज्ञानांत 'ज्ञाता' व 'ज्ञेय' हा संबंध आवश्यक असतो व म्हणूनच आत्म्याची जाणीव हैं एक ज्ञानाचे आवश्यक अंग आहे, अस कँटने प्रतिपादन केले आहे. पण हे ज्ञान होण्यास आपल्याला संवेदना आवश्यक आहेत. संवेदना येतील तेव्हांच मला संवेदना भासतात असे ज्ञान होईल, सारांश, आत्म्याच्या जाणिवेचे ज्ञान हे सापेक्ष आहे. ते संवेदनांशी संलग्न आहे. म्हणज विषय व विषयी किंवा ज्ञेय व ज्ञाता, किंवा बाह्य पदार्थ व आत्मा या दुकल सापेक्ष आहेत; त्या दोन्ही वस्तूंचे एकसमयावच्छेदेंकरून ज्ञान होते. अर्थात् दोन्हीही कल्पना आपल्या ज्ञानांत अंतर्भूत आहेत असे ज्ञानाच्या पृथक्करणावरून आपल्याला कळते. पण या आत्म्याचे मूळ स्वरूप काय; त्याचे गुण कोणते, तो अमर आहे काय, तो शरीराखेरीज बाहेर यहूं शकतो काय ? वगैरे प्रश्नांचे उत्तर मिळणें शक्य नाही. कारण हे अतींद्रिय ज्ञानाचे प्रश्न झाले व असें अतींद्रियज्ञान आपल्याला होणे शक्य नाही. कारण ज्ञान मीमांसेवरूनच कळते की संवेदना किंवा इंद्रियद्वारा अनुभव हा आपल्या ज्ञानाला आवश्यक आहे. अर्थात् आपल्या मानवी बुद्धीला अतींद्रियज्ञान शक्य नाही. कारण ती बुद्धि इंद्रियसंवेदनांनी मर्यादित आहे. ती स्वतंत्र शक्ति नाही, ती न उत्पन्न करूं शकत नाही, तर संवेदना अनुभवल्यावर बुद्धि त्यावर संस्कार करूं शकते इतकेंच. पण मानवी ज्ञानाचा पाया<noinclude>{{center|१०७}}</noinclude>
flk85a58efgpp2w3sqg7pap0rlilmkk
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११४
104
110365
230027
2026-05-16T11:21:21Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "संवेदना होय. व ह्यूमनें म्हटल्याप्रमाणे आत्म्याची आपल्याला संवेदना होत नाही. म्हणून तत्वज्ञानाचा हा भाग म्हणजे निवळ एक मानवी बुद्धीची घोडचूक होय. आपल्याला आत्मज्ञान नाही, म्हण..."
230027
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>संवेदना होय. व ह्यूमनें म्हटल्याप्रमाणे आत्म्याची आपल्याला संवेदना होत नाही. म्हणून तत्वज्ञानाचा हा भाग म्हणजे निवळ एक मानवी बुद्धीची घोडचूक होय. आपल्याला आत्मज्ञान नाही, म्हणून आत्म्याचें अमरत्व किंवा जडराहित्य किंवा अणुत्व वगैरे प्रश्न मानवी ज्ञानाच्या आटोक्याबाहेरचे आहेत.

{{gap}}बाह्य सृष्टीचे जे आपल्याला ज्ञान होतें तेंहि अर्थात् संवेदनात्मक असते म्हणून आपल्याला बाह्य सृष्टीचे केवल स्वरूप कळणे शक्य नाही. विवेकवादीपंथाने असें ज्ञान होते असे प्रतिपादन केले आहे खरे, पण संवेदनावादीपंथाने त्यांचे म्हणणे खोडून काढले आहे. कँटचे म्हणणे असे की, या परस्परविरोधी विधानांवरून हहि ज्ञान मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेरचे आहे असे दिसून येते. उदाहरणार्थ बाह्य सृष्टि ही मर्यादित आहे किंवा अमर्यादित आहे ह्यासंबंधी वाद आहे. दोन्ही विधाने प्रमाणाने सिद्ध करतां येतात. परंतु कँटचे मते आपल्याला बाह्य सृष्टीचें निश्चित ज्ञान होणे शक्य नाही. कारण अवकाश ही जर सृष्टिज्ञानाची एक आवश्यक अट आहे तर आपल्याला ह्य सृष्टीची मर्यादा संपली किंवा ती मर्यादा कींहि संपणार नाही असे म्हणता येत नाही. या दोन्ही स्थिति अतींद्रिय आहेत व आपल्या बुद्धीला अतींद्रियज्ञान होऊ शकत नाही. तसेंच बाह्य सृष्टि विभाज्य आहे किंवा अविभाज्य आहे, म्हणजे तिचे परमाणू आहेत किंवा नाहीत हे निश्चयाने सांगता येत नाही. कारण ही स्थिति अतींद्रिय आहे. असो.

{{gap}}आतां परमेश्वराची कल्पनाही अतीन्द्रिय आहे. म्हणूनच तो मानवी बुद्धीला अज्ञेय आहे. कारण परमेश्वर म्हणजे सर्वगुणसंपन्न व कारणरहित सृष्टीचे कारण होय. पण गुण हे आपल्याला संवेदनांनी कळतात तेव्हां सर्वगुणसंपन्नता कळणे शक्य नाही. कारण ती अतीन्द्रिय आहे. तसेच आपल्या बुद्धीला कारणरहित कारण कळणे शक्य नाही. कारण आपल्या बुद्धीला जें जें कळते त्याला त्याला कार्यकारणभाव लागू<noinclude>{{center|१०८}}</noinclude>
9qi17rrr7r9w2u2te7tv487hb1wro20
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११५
104
110366
230028
2026-05-16T11:22:55Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "आहे. तेव्हां 'कारणरहित कारण' ही कल्पनाच मुळी बुद्धिदृष्टया विसंगत आहे. तेव्हां असा पदार्थ आपल्याला कळणारच नाही.
{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल विवेकवादी जी प्रमाणे पुढे आणत..."
230028
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>आहे. तेव्हां 'कारणरहित कारण' ही कल्पनाच मुळी बुद्धिदृष्टया विसंगत आहे. तेव्हां असा पदार्थ आपल्याला कळणारच नाही.

{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल विवेकवादी जी प्रमाणे पुढे आणतात तीही सदोष आहेत असें कँटने दाखविले आहे.

{{gap}}परमेश्वर पूर्ण किंवा सर्वगुणसंपन्न आहे. तेव्हां तो अस्तित्वात असलाच पाहिजे. कारण जर त्याला अस्तित्व हा गुण नसेल तर तो सर्व. गुणसंपन्न होणार नाही. ईश्वराच्या अस्तित्वाचे हे प्रमाण सदोष आहे. कारण येथे आपण कल्पनेवरून अस्तित्वाकडे जातो. 'पूर्ण पदार्थाची' कल्पना आपल्या अपूर्ण पदार्थाच्या कल्पनेवरून सुचते खरी; पण कल्पना म्हणजे खरी सृष्टि नव्हे. कल्पना जर खरी सृष्टि असती तर कविकल्पना किंवा स्वप्नकल्पना ख मानाव्या लागतील. मानवी बुद्धि खऱ्या खोट्याचा निर्णय संवेदनावरून करते व परमेश्वराची कल्पना तशी संवेद्य नाही. तेव्हां तिचे अस्तित्व सिद्ध करणे अशक्य आहे.

{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाच्या दुसऱ्या प्रमाणांचे विवेकवाद्यांनी असें विवेचन केले आहे. बाह्य जग व मानवी मन अस्तित्त्वांत आहेत यांना काही तरी कारण असलेच पाहिजे व ते कारण परमेश्वर होय. पण कॅटचे मते हे प्रमाणही सदोष आहे. यांत जे तत्व आधिभौतिक शास्त्राला व सेय पदार्थाना लागू आहे ते तत्व अतीन्द्रिय पदार्थाला लागू केले आहे. म्हणूनच सृष्टीचे कारण परमेश्वर तर परमेश्वराचे कारण काय असा जडवादी रोखठोक जबाब विवेकवाद्यांना विचारतात व मग विवकवादी निरुत्तर होतात. कारण विवेकवादी व जडवादी यांमध्ये फारसा फरक राहत नाही. जडवादी 'जडा' शी थांबतात तर विवेकवादी एक पायरी पुढे जातात येवढेच. पण त्या पायरीच्या पुढे काय हा प्रश्न राहतोच. म्हणूनच कॅटचे म्हणणे बुद्धीने हा प्रश्न सुटण्यासारखाच नाही.

{{gap}}परमेश्वराच्या अस्तित्वाचे तिसरे प्रमाण म्हणजे सृष्टीच्या रचना चातुयांचे प्रसिद्ध प्रमाण होय. या प्रमाणाबद्दल कॅटला नेहेमी आदर वाटत असे; पण बुद्धिदृष्टया या प्रमाणावरून परमेश्वर 'सृष्टीचा विश्वकर्मा'<noinclude>{{center|१०९}}</noinclude>
0by6pgxcdevhypl92inr93voc5gc23e
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११६
104
110367
230029
2026-05-16T11:23:48Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "येवढेच फार तर सिद्ध होते; म्हणजे सृष्टीचे मूळ द्रव्य अनादि व स्वतंत्र मानावे लागते; परमेश्वर फक्त त्या जडद्रव्याची चतुराईने मांडणी करतो इतकेंच दिसून येते.
{{gap}}याप्रमाणे तत्त्व..."
230029
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>येवढेच फार तर सिद्ध होते; म्हणजे सृष्टीचे मूळ द्रव्य अनादि व स्वतंत्र मानावे लागते; परमेश्वर फक्त त्या जडद्रव्याची चतुराईने मांडणी करतो इतकेंच दिसून येते.

{{gap}}याप्रमाणे तत्त्वज्ञान मानवी बुद्धीच्या आटोक्याबाहेर आहे असें कँटनें दाखविले आहे. मानवी ज्ञानाच्या योगाने विवेकशक्तीला ' आत्मा, सृष्टीचे केवळ स्वरूप व परमेश्वर' या कल्पना सुचतात खऱ्या व या कल्पनांचा 'ज्ञानाचे ध्येय' म्हणून उपयोग आहे खरा. पण या कल्पना अतीन्द्रिय असल्यामुळे त्यांचे ज्ञान होणे शक्य नाही, या विवेचनालाच कँटचा बौद्धिक अज्ञेयवाद म्हणतात.

{{gap}}अर्थात् बुद्धीने तत्त्वज्ञान शक्य नाही असा कँटचा सिद्धांत आहे, पण बुद्धीखेरीज मानवी इतर शक्तीने या अतीन्द्रिय गोष्टीबद्दल डोळसश्रद्धा उत्पन्न होणे शक्य आहे. ती कशी उत्पन्न होते हे सांगणे म्हणजेच कँटच्या नव्या तत्त्वज्ञानाचा मथितार्थ सांगणे होय. तरी आतां शेवटी तिकडे वळू.

{{gap}}कँटच्या नव्या तत्वज्ञानाचा उल्लेख त्याच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथाचे शेवटी आला आहे खरा; व तेथे त्याने या तत्वज्ञानाची रूपरेखा दिली आहे खरी; तरी पण त्या तत्वज्ञानाचे त्याच्या पुढच्या परीक्षणात्मक ग्रंथांत सविस्तर विवरण आलेले आहे. त्याच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथाचा शेवट अज्ञेय वादांत होतो खरा; पण कँट येथेच थांबत नाही. आपल्या ज्ञानांने सूचित केलेले आत्मा' 'परमेश्वर ' इत्यादि प्रश्न आपल्या बुद्धीला सुटले नाहीत तरी ते मानवी मनाच्या इतर शक्तींच्या आवाक्याबाहेरचे आहेत अशांतला भाग नाही; असें कँटचे म्हणणे आहे व हा मुद्दाच त्याने आपल्या पुढील परीक्षणात्मक ग्रंथांत प्रमुखपणे पुढे आणला आहे.

{{gap}}त्याच्या दुसऱ्या परीक्षणात्मक पुस्तकाचा विषय सद्सद्विवेकशक्ती हा होय. मनुष्याला पुष्कळ वासना आहेत; त्यामुळेच मनुष्य प्रवृत्ति पर बनून वर्तन करतो. पण पशुप्रमाणे मनुष्याचे वर्तन केवळ वासनावर<noinclude>{{center|११०}}</noinclude>
p9ltkof8z9ebytmj2mfgswmgnm52y8j
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११७
104
110368
230030
2026-05-16T11:24:23Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "अवलंबून नसते. तेथेही मनुष्याची विवेकशक्ति पुढे येते व मनुष्याला आज्ञा करते. म्हणून त्या विवेकशक्तीला सद्सद्विवेकशक्ति म्हणतात.' तूं अमूक मार्गानेच वागले पाहिजे, तुझें अमुक कर्..."
230030
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>अवलंबून नसते. तेथेही मनुष्याची विवेकशक्ति पुढे येते व मनुष्याला आज्ञा करते. म्हणून त्या विवेकशक्तीला सद्सद्विवेकशक्ति म्हणतात.' तूं अमूक मार्गानेच वागले पाहिजे, तुझें अमुक कर्तव्यकर्म आहे' अशी सद्सद्विवेकशक्ति आज्ञा करते. आतां, ही आज्ञा ' तुला लेखक व्हावयाचे असेल तर चांगले अक्षर कर; किंवा तुला सुख पाहिजे असेल तर वासनातृप्ति कर' अशा तऱ्हेची शर्तीची आज्ञा नसते. तर ती बिनशर्त आज्ञा असते. 'विवेकी मनुष्य म्हणून तूं हे केले पाहिजेस, तुझे कर्तव्यकर्म म्हणून हे केले पाहिजेस; फलाशा ठेवून कर्म करतां कामा नये' अशा तऱ्हेची ही आज्ञा असते. अर्थात् अशी आज्ञा पाळणे म्हणजे वासनांना बाजूस सारून केवळ विवेकाचे पाय धरणे होय. ही आज्ञाच सर्व नीतिनिबंधाचा मूळ पाया होय. या बिनशर्त आशेपासूनच सर्व नीतीचे नियम निघालेले आहेत. आतां या आशेचे स्वरूप तरी काय आहे ? अर्थात् या आज्ञेत विशेष वासनांचा समावेश होत नाही, या आशेंत सुखाच्या कल्पनेचे ध्येय येत नाही. ही आज्ञा कर्तव्य म्हणून कर्तव्य करा इतकेच सांगते. तुमचे कर्तव्य कोणतें हैं तुमच्या परिस्थितीवर व समाजांतील दर्जावर अवलंबून राहील. पण तुमचे कर्तव्यकर्म कर्तत्वकर्म म्हणून करा फलाशेने करूं नका इतकेच विवेकाचे म्हणणे आहे. अर्थात् ही आज्ञा सर्व माणसांना लागू आहे. ती सदा सर्वकाळ पाळावयाची आहे. ती एकाला आहे आणि दुसयाला नाही अशांतला भाग नाही; तिला अपवाद टाऊक नाही. एकाच परिस्थितीत जर एका मनुष्याचे एक कर्तव्यकर्म असले तर त्याच परिस्थितीत ते सर्व मनुष्यांचे कर्तव्य कर्म असले पाहिजे असे ती आज्ञा म्हणते. 'तूं अशा तऱ्हेने वाग की तुझ्या वागण्याचे तत्व तुझ्या इच्छेने सार्वत्रिक नियम करतां आल्यास तुझ्या विवेकाला तें तत्व आवडेल ' असे या आज्ञेचे स्वरूप कँटने दिले आहे. याला त्याने नैतिक कायदा म्हटले आहे व सर्व नीतिनियम या कायद्यापासून निष्पन्न होतात असे कँटने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ सत्य बोलण्याचा<noinclude>{{center|१११}}</noinclude>
o07v3zrhay2u8i6sq6w379vll3klidv
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११८
104
110369
230031
2026-05-16T11:24:58Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "नियम घ्या. खोटे बोलून दुसऱ्याला फसविण्याची आपल्याला इच्छा होते. तेव्हां जर खोटें बोलण्याचे तत्व रास्त आहे तर सर्वांनी अशा प्रसंगी खोटे बोलण्यास हरकत नाही असें ठरते. पण असा सार्व..."
230031
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>नियम घ्या. खोटे बोलून दुसऱ्याला फसविण्याची आपल्याला इच्छा होते. तेव्हां जर खोटें बोलण्याचे तत्व रास्त आहे तर सर्वांनी अशा प्रसंगी खोटे बोलण्यास हरकत नाही असें ठरते. पण असा सार्वत्रिक नियम झाला तर कोणी कोणावर विश्वास ठेवणार नाही. व मग आपलें खोटें बोलण्याचा उपयोग नाही; तेव्हां खोटे बोलण्याची इच्छा म्हणजे अपवादात्मक आहे. आपण मात्र खोटे बोलावें व सर्वत्रांनी खरे बोलण्याचा नियम पाळावा असे आपल्याला वाटते. या विवेचनावरून खोटे बोलणे नैतिक कायद्याच्या विरुद्ध म्हणूनच अनीतीचे ठरते.

{{gap}}तसेंच एखाद्याला चोरीची इच्छा झाली तर ही वाईट की चांगली ? जर चांगली तर सर्वांनी सर्वांच्या वस्तु न विचारतां घेणं रास्त होइल. पण मग चोरीचा उद्देश नाहीसा होईल. कारण आपल्याजवळ चोरलेली वस्तु कशी राहील? दुसरा आपल्या व न विचारतां ती घेऊन जाईल व न विचारतां घेऊन जाणे यांत कांहीं वावगे नाही असे आपल्या वर्तनाचें तत्व सांगते. पण अशी सार्वत्रिक अदाधुंदीची स्थिति आपल्या विवेकशक्तीला बरोबर वाटत नाही. येथेसुद्धां सामान्य नियम व आपल्यापुरतां अपवाद आपल्याला पाहिजे असतो व म्हणून अशी अपवादात्मक वर्तणुक नैतिक कायद्याविरुद्ध ठरते. आणखी एक उदाहरण घेऊ. एखादा गरजू आपल्याजवळ मदत मागावयास आला तर ती त्याला द्यावी किंवा नाही? आपली स्वार्थी इच्छा म्हणते देऊ नये. पण आपले करणे रास्त असेल तर कोणी कोणास संकटांत मदत करूं नये असा सार्वत्रिक नियम ठरतो. पण असा नियम व्हावा अशी आपली खरी इच्छा नसते. आपण संकटांत असलो म्हणजे दुसऱ्यांनी आपल्या मदतीला यावे असे आपणास वाटते तेव्हां येथे सुद्धा दुसऱ्याला मदत न करण्याची स्वार्थी बुद्धि ही अपवादात्मक असते. म्हणजे आपण मात्र दुसऱ्यास मदत करूं नये, दुसऱ्याने मात्र आपल्या मदतीस धावावें असे आपले आपलपोटेपणाचे वर्तन असते व म्हणूनच आपलपोटेपणा हा नैतिक दुर्गुण ठरतो.{{nop}}<noinclude>{{center|११२}}</noinclude>
lb5a49kksmoy9nv2r3u4uxgpi0841ms
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११९
104
110370
230032
2026-05-16T11:25:35Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "याप्रमाणे कँटने सदसद्विवेकशक्तीचे पृथक्करण करून नीतीनियमाची मीमांसा केली आहे. आतां या पृथक्करणावरून त्यांत कोणती गृहीततत्त्वे समाविष्ट झालेली आहेत, याचे विवेचन करणे क्रमप्र..."
230032
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>याप्रमाणे कँटने सदसद्विवेकशक्तीचे पृथक्करण करून नीतीनियमाची मीमांसा केली आहे. आतां या पृथक्करणावरून त्यांत कोणती गृहीततत्त्वे समाविष्ट झालेली आहेत, याचे विवेचन करणे क्रमप्राप्त आहे.

{{gap}}नीतिशास्त्रांतला पहिला सिद्धांत म्हणजे कर्तव्यकर्माची जाणीव होय. "मी अमुक एक गोष्ट केलीच पाहिजे; ते माझे कर्तव्यकर्म आहे.' पण विधानामध्ये माझी स्वतंत्रताशक्ति गृहीत धरली आहे. (I ougbt therefore I can ) माझें कर्तव्यकर्म आहे म्हणजे मला तसे वागण्याची स्वतंत्र शक्ति आहे, बाह्य सृष्टीला लागू असणारा कार्यकारणभाव मला लागू नाही. मी आपल्या सदसद्विवेकशक्तीप्रमाणे वागण्यास समर्थ आहे असें सिद्ध होते बाह्य सृष्टीतील गोष्टींच्या बाबतीत अमुक केले पाहिजे असें आज्ञापक विधाने निरर्थक होय, कारण बाह्य वस्तु सृष्टिनियमानी बद्ध आहेत, त्यांना निराळ्या तऱ्हेनें वागणे शक्य नाही; पण विवेकी मानवप्राण्याला स्वतंत्रता आहे व म्हणून त्याच्या विवेकशक्तीच्या आशेला अर्थ व महत्त्व आहे. तेव्हां नीतिविषयक सदसद्विवेकशक्तीच्या आज्ञेपासून आत्म्याचे स्वतंत्र व कार्यकारणभावरहित अस्तित्व सिद्ध होते. आपली बुद्धि या आत्म्याच्याबद्दल असले विधान करू शकत नव्हती. कारण आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व ही कल्पनाच मुळी अतीन्द्रिय आहे व अशा कल्पनेचा प्रत्यय मानवी बुद्धीला होऊ शकत नाही. पण आतां आपल्या नैतिक अनुभवावरून आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व आपत्याल मानणे भाग आहे. कारण या अनुभवाने,हें एक गृहीत तत्व आहे, असे दिसून येते.

{{gap}}सदसद्विवेकशक्तीने दिलेल्या नैतिक कायद्यापासून दुसरें एक गृहीततत्व सिद्ध होते ते असें. आपली सदसद्विवेकशक्ति म्हणते की, आपले कर्तव्यकर्म फलाशेने किंवा वासनांनी किंवा भावनांनी प्रेरित होऊन करूं नका तर कर्तव्य म्हणून सदसद्विवेकाची आज्ञा म्हणून करा. सारांश कर्तव्यकर्म करतांना फलाशा वासना किंवा भावना यांचा लेशसुद्धां मनांत वावरू देऊ नका असें विवेक सांगतो. पण जोपयत मानवी आयुष्य<noinclude>{{center|११३}}</noinclude>
mmqsuz064037sjmpydxasshmt8c3ovb
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२०
104
110371
230033
2026-05-16T11:26:08Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "देहाशी संलग्न आहे तोपर्यंत वासनाच्छेद, फलाशाछेद किंवा भावनाच्छेद सर्वांशी होणे शक्य नाही असा आपला अनुभव आहे. पण ही गोष्ट जर अशक्य असती तर विवेकशक्ति अशी निरर्थक व निरुपयोगी आज्..."
230033
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>देहाशी संलग्न आहे तोपर्यंत वासनाच्छेद, फलाशाछेद किंवा भावनाच्छेद सर्वांशी होणे शक्य नाही असा आपला अनुभव आहे. पण ही गोष्ट जर अशक्य असती तर विवेकशक्ति अशी निरर्थक व निरुपयोगी आज्ञा कशी करती? केवळ विवेकाची आज्ञा म्हणून वर्तन करणे आपल्याला साध्य झाले पाहिजे तर ती आज्ञा अन्वर्थक होईल, तेव्हां हा आज्ञा एका जन्मांत पाळण्यासारखी नसल्यास तिची पूर्तता पुढल्या जन्मांत होईल व अर्थात असे होण्यास आत्मा अमर असला पाहिजे असे मानण्यास आपण तयार झाले पाहिजे, म्हणजे नीतीच्या कायद्यावरून आत्म्याचे अमरत्व निष्पन्न होते. हे नीतिशास्त्रांतून निघणारे दुसरे गृहीत तत्व होय.

{{gap}}आतां नीतिशास्त्रांतून निघणारे तिसरे गृहीत तत्व परमेश्वराच्या अस्तिस्वाचे होय. कँटने हे तत्व खालील पद्धतीने सिद्ध केले आहे. आपण मनुव्याच्या पुरुषार्थाच्या कल्पनेचा विचार करूं लागलों म्हणजे श्रेयस व प्रेयस किंवा धर्म व काम किंवा हित व सुख या दुकलीची आठवण होते. म्हणजे या दुकलीपैकी दोन्ही गोष्टी जरी परस्पर भिन्न किंवा विरुद्ध आहेत, तरी त्या एकत्र असाव्या तरच मानवी आयुष्याचे खरे ध्येय साध्य झाले असे म्हणता येईल. सारांश, सद्गुणी मनुष्य नेहेमी सुखी असावा असे आपली विवेकशक्ति सांगते. केवळ सद्गुण किंवा केवळ सुख येवढ्याने मानवी आयुष्याची साफल्यता झाली असें विवेक शक्तीला वाटत नाही. तर खऱ्या आयुष्याच्या साफल्यतेला सद्गुण व सुख याचा सांगड पाहिजे असें विवेक कंठरवाने सांगतो. विवेकाची नैतिक आज्ञा तर निवळ सदगुणांबद्दल आहे, उलट सुखाकडे पाहूं नको असे त्याच म्हणणे आहे. तरी पण अंती सद्गुणी माणसाला सुख व्हावे असे आपत्याला वाटते. तसेच दुर्गुणी माणूस दुःखांत असावासें आपल्या विवेक शक्तीला वाटते. पण आयुष्यांत तर नेहेमी याच्या उलट अनुभव येता.

{{gap}}दुर्गुणी माणसें वैनीत व सुखांत आहेत असे आपण पाहता तर सद्गुणी माणसें हालअपेष्टा व दु:ख भोगीत आहेत असे आप<noinclude>{{center|११४}}</noinclude>
7o4pi408z6f63v3zphm5nmosp1k6qdi
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२१
104
110372
230035
2026-05-16T11:26:43Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ल्याला दिसते. पण ही वस्तुस्थिति आपल्या विवेकाला पटत नाही. तेव्हां आपली सहज भावना होते की, या जगांत परमेश्वर आहे व जरी हल्लीच्या जगांत अशी वस्तुस्थिति असली तरी ती क्षणीक आहे निरंत..."
230035
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>ल्याला दिसते. पण ही वस्तुस्थिति आपल्या विवेकाला पटत नाही. तेव्हां आपली सहज भावना होते की, या जगांत परमेश्वर आहे व जरी हल्लीच्या जगांत अशी वस्तुस्थिति असली तरी ती क्षणीक आहे निरंतरची नाही; परमेश्वराच्या घरी सद्गुणाला सुख लाभलेच पाहिजे व दुर्गुणाला शासन झालेच पाहिजे व जगाचा कर्ता तो न्यायी परमेश्वर येथे नाही तर स्वर्गात तरी सदगुणांची व सुखाची सांगड घालून देईल. तेव्हां या सर्व न्यायी परमेश्वराच्या अस्तित्वाच्या कल्पनेने आपल्या नैतिक आकांक्षाचे समाधान होते व असा न्यायी परमेश्वर नैतिक कल्पना असणाऱ्या जगाच्या मूळाशी असलाच पाहिजे अशी आपली विवेकवाणी सांगते व आपल्या नैतिक अनुभवावरून तो आपल्याला श्रद्धेय आहे असेंही वाटते.

{{gap}}सारांश, बुद्धीला ज्या गोष्टी शास्त्रीयदृष्टया म्हणजे संवेदनात्मक ज्ञानदृष्टया सिद्ध करता येत नाहीत, त्या गोष्टी आपल्या नैतिक अनुभवाने सिद्ध करतां येतात व म्हणून तत्वज्ञान हे बौद्धिक अनुभवाच्या पायावर न उभारतां-कारण तेथें अज्ञेयवाद व जडवाद आपल्याला निरुत्तर करतात-नैतिक अनुभवाच्या पायावर उभारावे असे कँटच्या प्रतिपादनाचें सार आहे व यालाच तो आपले नवे तत्वज्ञान म्हणतो; मात्र आत्मा, परमेश्वर वगैरे अतींद्रिय गोष्टींचे ज्ञान झाले असें न म्हणतां याबद्दल आपली विवेकी श्रद्धा उत्पन्न झाली असे तो म्हणतो. अर्थात् ही तडजोड कँटनें जडवाद्यांचे व अज्ञेयवाद्यांचे तोंड बंद करण्याकरितां सुचविली आहे असे दिसते.

{{gap}}कँटच्या तिसऱ्या परीक्षणात्मक पुस्तकाचा विषय जडाजड जगांत दिसून येणारे सौंदर्य, भव्यता, प्रयोजन व रचनाचातुर्य इत्यादि गोष्टींचें विवेचन करण्याचा आहे. व या विवेचनावरून या जगाला कोणी तरी चिन्मय कर्ता आहे असे मानवी मनाला वाटावयाला लागते, तेव्हां ज्याप्रमाणे आपल्या नैतिक अनुभवावरून मनुष्यामध्ये परमेश्वराच्या अस्तिस्वाबद्दल श्रद्धा उत्पन्न होते त्याप्रमाणेच मनुष्याच्या सौंदर्यविषयक अनु<noinclude>{{center|११५}}</noinclude>
apy26qzizcy0febjoek1cjxavg8q39w
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२२
104
110373
230036
2026-05-16T11:27:19Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "भवावरून परमेश्वरविषयक भावना मनांत उत्पन्न होते असे कॅटने या ग्रंथांत प्रतिपादन केले आहे.
{{gap}}तात्पर्य, कॅटचे नवे तत्वज्ञान जरी अज्ञेयवादी आहे असे प्रथमदर्शनी वाटले तरी त्या त..."
230036
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>भवावरून परमेश्वरविषयक भावना मनांत उत्पन्न होते असे कॅटने या ग्रंथांत प्रतिपादन केले आहे.

{{gap}}तात्पर्य, कॅटचे नवे तत्वज्ञान जरी अज्ञेयवादी आहे असे प्रथमदर्शनी वाटले तरी त्या तत्वज्ञानाचा सर्व रोख परमेश्वराचे व आत्म्याचे अस्तित्व सिद्ध करण्याकडे आहे यात शंका नाही. कँटचे म्हणणे थोडक्यांत असें सांगतां येईल; परमेश्वर किंवा आत्मा आपल्याला दृष्टीने दिसत नाही. कारण हे पदार्थ उघड उघड अतींद्रिय आहेत, तेव्हां परमात्मा व जीवात्मा बुद्धिगम्य आहेत व बाह्य जगाप्रमाणे आपल्याला त्यांचे अस्तित्व कळते अशा तऱ्हेचचा आग्रह धरण्यांत अर्थ नाही. येथें अज्ञेयवादच पतकरणे श्रेयस्कर आहे. कारण, परमेश्वर आम्हांला कळत नाही. आमच्या आटोक्याबाहेरचा तो विषय आहे इतकें सिद्ध झाले तर निदान जडवाद्यांचे किंवा नास्तिक्यवाद्यांचे तोंड बंद होते. याप्रमाणे दोघांची तोडे बंद केल्यावर आपल्याला नीतिशास्त्राचा व नैतिक अनुभवाचा आश्रय करावयास सांपडतो. या नैतिक अनुभवावरून आपली परमेश्वराच्या व आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल सकारण व विवेकी श्रद्धा उत्पन्न होते; नव्हे सौंदर्यविषयक भावनांनी तर परमेश्वर साक्षात् आपल्याला भासमान होतो, म्हणजे जरी परमेश्वर मानवी मनाला कळत नाही; तरी त्यावर श्रद्धा बसते व जणू कांहीं तो आपल्यापुढेच उभा आहे असा भासतो. इतकेच आपल्याला परमात्म्याबद्दल समजते. पण हे समजणे काही थोडे नाही. त्याने आपण धर्मपरायण व नीतिपरायण होण्यास हरकत नाही व अशा तऱ्हेनें तत्वज्ञानाचा विकास केल्यास नास्तिक्याचा व जडवादाचा जगातून नायनाट व्हायला हरकत नाही. हे कॅटच्या शिकवणीचे सार होय व म्हणूनच कॅटचे तत्वज्ञान सर्व युरोपभर पसरले व कॅट हा तत्वज्ञानांतील क्रांतिकर्ता बनला.
{{center|{{xx-larger|समाप्त}}}}<noinclude>{{center|११६}}</noinclude>
n8c2813sncdlmvkan4us1g3n4cxmd4f
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२३
104
110374
230037
2026-05-16T11:28:25Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{center|प्रो०. गोविंद चिमणाजी भाटे यांची}} {{center|{{x-larger|'''विक्रीस तयार पुस्तकें.'''}}}}

{{Block center|<poem>१ अर्थशास्त्राची मूलतत्त्वे २४८ २ समाजशास्त्रावरील व्याख्याने ३ सज्जनगड व समर्थ रामदास ४१२..."
230037
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>{{center|प्रो०. गोविंद चिमणाजी भाटे यांची}}
{{center|{{x-larger|'''विक्रीस तयार पुस्तकें.'''}}}}

{{Block center|<poem>१ अर्थशास्त्राची मूलतत्त्वे २४८
२ समाजशास्त्रावरील व्याख्याने
३ सज्जनगड व समर्थ रामदास ४१२
४ माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
किंवा हरिद्वार-मथुरा-वृंदावनादि
स्थळांची सचित्र वर्णनें ४१२
५ माझा अटकेपार प्रवास-सचित्र ४१२
६ हिंदुस्तानचे नंदनवन-सचित्र ४१२
७ कार्लाईल व हिंदूचालीरीति १
< चरित्र-पंचक-सचित्र (छापत आहे) ४१२
</poem>}}

{{Block center|<poem>आर. आर. आणि मंडळी,
केतकर यांचा बंगला, सांगली
</poem>}}<noinclude></noinclude>
sf17fvj6u8patq80mamvk82rvaswdf9