विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.2 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:Paripurti.pdf/92 104 20914 230155 71501 2026-05-19T06:11:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230155 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १०६ / परिपूर्ती}}</noinclude>म्हणजे तोंड कसं सुरेख दिसेल!" तिचा क्षणिक रुसवा नाहीसा झाला. स्नान करून, नव्या मुखवट्याने आपण रथात बसलो आहोत व लाखो मानव भोवती जयघोष करीत आहेत ह्या स्वप्नात ती पुजाऱ्याचा अपराध विसरली.
{{gap}}जगन्नाथाची खिन्नता आणखी वाढली. "पोरी, यंदा रथयात्रा आपल्या नशिबी आहे का नाही कोण जाणे!" तो भरल्या गळ्याने म्हणाला. सुभद्रेचे लक्ष नाही हे पाहून तो आणखी काही बोलणार एवढ्यात सुभद्रेच्या पलीकडून दटावणीचा गंभीर आवाज आला, "कृष्णा, तुझ्या शंका-कुशका मनातच ठेवीनास? तिच्या सुखी जीवनाला काळजीची कीड लावून तुला काय मिळणार? जे होणार ते चुकत नाही. त्याचा विचार करून काय उपयोग?" "बरं आहे, दादा." जगन्नाथ पडल्या आवाजात म्हणाला. गाभाऱ्यात घुमणारा आवाज थांबला. परत सर्वत्र शांतता पसरली. पुरीच्या जगन्नाथाच्या मंदिरातील मूर्ती आपले निश्चळ डोळे समोर लावून उभ्या होत्या. पाच-पंचवीस दर्शनेच्छू भाविक अंधारातच चाचपडत पंड्यांचे हात धरून गर्भगृहात येत होते. पायांखालची जमीन ओलसर, बुळबुळीत लागत होती. यात्रेकरू एकमेकांचे हात धरून जपून चालले होते. ही वेळ व हा महिनाही विशेष गर्दीचा नव्हता, पण जगन्नाथाच्या देवळात दोन-चारशे लोकांची आवकजावक नाही असे क्वचितच होई. अंधारातून गाभाऱ्यात गेले म्हणजे तेथे लावलेल्या समयांच्या उजेडात देवाचे पहिले दर्शन होते ते आश्चर्यकारकच वाटते. समोर तीन प्रचंड उभ्या आकृती व त्यांची चमत्कारिक रंगवलेली तोंडे दिसतात. डाव्या हाताला सात फूट उंचीचा पांढऱ्या शुभ्र तोंडाचा, मोठाल्या शंखाकृती डोळ्यांचा बलभद्र, उजव्या बाजूला सहा फूट उंचीचा काळ्याभोर तोंडाचा व मोठाल्या गोल डोळ्यांचा जगन्नाथ ऊर्फ कृष्ण व दोघांच्यामध्ये ठेंगणीशी, चार फुटांची, पिवळ्या तोंडाची सुभद्रा असे हे देवतात्रय आहे. ह्या श्रद्धावस्तूंना मूर्ती हा शब्द योग्य होणार नाही; प्रथमदर्शनी त्यांच्यात मानवी असे काही वाटत नाही. मूर्तीची नके तेवढी मोहि, पुढे आलेली व्यंगचित्रासारखीच दिसतात. हात म्हणजे कमरेपासून पुढे आलेले दोन दोन दांडकी आहेत व त्यावर लहान मुले काढतात तसे डोळे, नाक व तोंड काढली आहेत. कपाळ व भुवया जवळजवळ नाहीतच. डोळे भक्तांकडे रागाने रोखल्यासारखे वाटतात. तर तोंडाच्या लालचुटूक चन्द्रकोरीचे अक्षय हास्य मानवांना वेडावून दाखवते आहे अशी<noinclude></noinclude> kxx3g021loy75pky0bc953q3tuqb99v पान:Paripurti.pdf/93 104 20915 230156 71507 2026-05-19T06:18:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230156 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १०७ }}</noinclude>भावना होते. ह्या मूर्ती लाकडाच्या ओंडक्यांच्या बनवलेल्या आहेत. दरवर्षी ज्येष्ठी पुनवेला त्यांना सर्वांगस्नान घालतात. त्या मूर्तीच्या तोंडाचा रंग धुवून जातो. देवळाचे दरवाजे बारा दिवस बंद असतात. देवाचे दैता (दैत्य) नावाचे सेवक मूर्तीना मुखवटा चढवून तो रंगविण्यात गुंतलेले असतात. मुखवटे रंगवून झाले की, देवांना नवा साज चढवतात व मूर्ती मंदिराबाहेर आणून तीन निरनिराळ्या रथांत ठेवतात आणि जगन्नाथाच्या रथयात्रेला प्रारंभ होतो. रथयात्रेच्या आदल्या दिवशी नवा रंग दिलेल्या मूर्तीचे भक्तांना दर्शन होते. ह्या दर्शनाला 'नवयौवन' दर्शन म्हणतात. सुभद्रा गुंतली होती ती ह्याच स्वप्नात. वर्षभर पुजून पुजून जुने झालेले तोंड धुऊनपुसून स्वच्छ होईल; बारा दिवस चेहऱ्याची रंगरंगोटी चालेल; नंतर 'नेत्रोत्सवा'च्या दिवशी डोळे रंगवतील; मग महावस्त्रे अंगावर चढवतील आणि मंदिराचे दरवाजे उघडले म्हणजे हजारो लोक एकमेकांना ढकलीत, चिरडीत माझे 'नवयौवन' निरखतील असे ती मनात म्हणत होती-
{{gap}}पण जगन्नाथाचे मन सुचिंत नव्हते. चैत्री पूर्णिमेला 'दयिता' सेवक 'बसेली' देवीच्या मंदिरात गेले होते. त्यांना नवघटस्थापनेचा कौल मिळाला होता व त्यांनी 'बसेली'च्या गळ्यातील माळ देवीच्या अनुमतीचे निदर्शक म्हणून 'भितरेछ' महापात्राच्या स्वाधीन केली होती, इतकी हकीकत पुजाऱ्यांच्या बोलण्यातून त्याने ऐकली होती. त्याच्याही आधी "यंदा अधिक आषाढ आहे" हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडी होते. 'अधिक आषाढ' ह्या शब्दांनी देवाच्या मनात हुरहूर उत्पन्न झाली होती; जणू जन्मांतरीच्या स्मृती जागृत होत होत्या.
{{gap}}खरोखरच 'अधिक आषाढ' हे शब्द जन्मांतरींच्या स्मृती जागृत व्हाव्यात असेच होते. वीस वर्षांत जेव्हा अधिक आषाढ येतो तेव्हा जगन्नाथाच्या देवळातील मूर्ती नव्याने बनतात. आज वैशाख पूर्णिमा; सकाळी पाच वाजता भितरेछ महापात्र नेहमीप्रमाणे आले व त्यांनी देवळाचे दरवाजे उघडले. सिंहद्वारामागून एक एक दार उघडीत शेवटी गर्भगृहाचे दार उघडले. महापात्र किंवा नुसते पात्र असे नाव उडिशात पुष्कळ ब्राह्मणांचे असते. 'भितरेछ' म्हणजे 'अभ्यंतरेश' असावे असे दिसते ह्यांच्याकडे देवळाच्या आतील सर्व व्यवस्था असते. देवाचे नवे विग्रह करावयाचा हुकूमही तेच देतात. आज गर्भगृहाचे दार उघडल्याबरोबर ते आत आले, देवाच्या पायांवर त्यांनी डोके ठेवले, मग<noinclude></noinclude> q9yvh05extzoa7gi6xs5angfpao0y9s पान:Paripurti.pdf/94 104 20916 230157 71519 2026-05-19T06:25:35Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230157 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १०८ / परिपूर्ती}}</noinclude>मागे सरून, हात जोडून, डोळे मिटून क्षणभर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यांतून आसू ओघळलेले दिसले. त्यांनी उपरण्याने डोळे पुसले. "प्रभू! ठाकूरजी! मर्जी तुझी!' असे म्हणून ते बाहेर गेले. बाहेर 'दयित' सेवक हात जोडून उभे होते. "जा, दारुशोधार्थ जा, यंदा नव्या घटाची स्थापना करायची!" अशी आज्ञा त्यांनी दिली व जड पावलांनी ते मंदिरातून परतले. इतर सेवायतांचे डोळे थोड्याशा उत्सुकतेने व करुणेने त्यांच्याकडे लागले होते. ज्या वर्षी नव्या मूर्ती बसतात त्या वर्षी भितरेछ महापात्र मरतात असा सर्वांचा समज आहे. (१९५० साली नव-कलेवर वर्ष होते व उत्सव आटपल्यावर भितरेछ महापात्र मेले अशी माहिती ओरिसा सरकारच्या माहितीखात्याने प्रसिद्ध केली आहे.) दारु म्हणजे लाकूड. देवतांच्या मूर्तीचे लाकूड काही विशिष्ट गुणधर्म व चिन्हे असलेल्या कडुलिंबाच्या झाडाचे असावे लागते. फार प्राचीन काळी जगन्नाथ हा शबर लोकांचा देव होता व तो त्यांनी गुप्त ठिकाणी ठेवला होता. माळव्याच्या इंद्रद्युम्न राजाच्या विद्यापती नावाच्या पुरोहिताने शबरराजकन्येचे प्रेम संपादून देवाचे गुह्यस्थान हडकून काढले व मग इन्द्रद्युम्न राजाने देवाची जगन्नाथ ह्या नावाने पुरी येथे स्थापना केली अशी कथा आहे. विद्यापतीने शबरराजकन्येशी लग्न केले. त्याचे वंशज ते दयित (दैत्य?) सेवायत. हे दैत लोक जगन्नाथाला आपला वंशज मानतात. रथोत्सवाचे वेळी व स्नानपूर्णिमेनंतर देव त्यांच्या स्वाधीन असतात. देवाचे नवे विग्रह करण्याचे कामही त्यांचेच असते. भितरेछ महापात्राची आज्ञा मिळाल्यावर सर्वजण मिळून जवळच असलेल्या काकतपूर गावी मंगलादेवीच्या दर्शनाला गेले. तेथे एका सेवायताच्या अंगात देवीचा संचार होऊन झाडे कुठे आहेत ते कळले. मग तेथे जाऊन सोन्या- चांदीच्या कुऱ्हाडीचे पहिले घाव घातल्यावर झाडे तोडून रथात ठेवली व वाजतगाजत पुरीला आणली. तीनही झाडांचे जाड बुंधे देवळाच्या आवारात नेऊन 'विश्वकर्मा' नावाच्या वंशपरंपरा मूर्ती घडविणाऱ्या सेवायतांच्या हवाली करण्यात आले. आता अवधी थोडा उरला होता. स्नानपूर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी आषाढ सुरू होतो. (उत्तरेकडे महिना आपल्याकडच्यासारखा अमावास्यान्त नसून पौर्णिमान्त असता.) तो वेळी देवतांना रंगरंगोटी चालते. त्याच्या आत मूर्ती घडल्या पाहिजेत. मूर्तीचे शिल्प काही मोठेसे कठीण नव्हते. मूर्ती लवकरच तयार झाल्या व<noinclude></noinclude> 2mumwhey4vqo69en9wscrt0ginpn9ul पान:Paripurti.pdf/95 104 20917 230158 71527 2026-05-19T06:28:45Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230158 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १०९ }}</noinclude>तीन लहान-लहान रथांत बसवून त्यांना 'अनवसरघरां'त आणले.
{{gap}}स्नानपूर्णिमेच्या दिवशी स्नान झाले की संध्याकाळी जगन्नाथ आपल्या भावा-बहिणीबरोबर मुख्य गर्भगृहात न जाता अनवसर मंडपात जातो व देवालयाचे दरवाजे बंद होतात. स्नानामुळे धुवून गेलेला रंग व मुखवटा नवा चढवतात तोवर देव भक्तांना दर्शन देत नाही म्हणून 'अनवसर' असतो व त्या काळात राहण्याचे ठिकाण ते 'अनवरसघर' ऊर्फ 'मंडप.'
{{gap}}इकडे मूर्ती घडत असता जुन्या विग्रहांचे उपचार व भोग रोजच्याप्रमाणे चालू होते. स्नानपूर्णिमेच्या दिवशी तिन्ही मूर्तीचे भक्तांचे देखत स्नान झाले व नेहमीप्रमाणे तिघेही अनवस घरात गेली. सुभद्रा वाट पाहात होती की, आता दैत सेवायत येऊन आपल्याला दरवर्षीप्रमाणे नवलावण्य देतील म्हणून; पण आज काही निराळाच प्रकार होता. रथांचा आवाज ऐकू आला व तीन नवीन मूर्तीना आणून जुन्या मूर्तीसमोर उभे केले. आता प्रश्न जन्मांतरीच्या आठवणीचा नव्हता, प्रत्यक्ष जन्मांतरीचे दृश्यच डोळ्यांसमोर होते. बारा वर्षे का अकरा वर्षे झाली बरे त्या गोष्टीला? ह्याच अनवसरघरात आपणही रथात बसून आलो होतो. नव्हे का? आपल्यासमोर धुपलेल्या मूर्ती फिकट तोंडाने उभ्या होत्या. पुढे काय होणार ह्याची तिला कल्पना नव्हती, पण तिचे हृदय मरणाऱ्या पतंगाप्रमाणे फडफड करीत होते. तिने कृष्णाकडे पाहिले, पण तिच्याकडे तो पाहत नव्हता. तिने बलरामाला 'दादा' म्हणून हाक मारायचा प्रयत्न केला, पण तोंडातून शब्दच उमटेना.
{{gap}}ठाकूर जगन्नाथ निश्चळ शरीराने व निश्चळ डोळ्यांनी पाहात होता. पुढे ठेवलेल्या कलेवरांना रोज हळूहळू रूप येत होते. जगन्नाथाच्या समोरचे लाकूड जगन्नाथासारखे, सुभद्रेच्या समोरचे सुभद्रेसारखे व बलरामापुढचे बलरामासारखे दिसू लागले. त्यांना वस्त्रप्रावरणादि शृंगार होऊ लागला, पण ता अजून 'कलेवर' होती. त्यांना प्राण नव्हता. जगन्नाथाच्या नाशिवंत शरीरातील अक्षर आत्म्याचे नवे घर घडत होते. समाधिस्थ स्थितीतील जगन्नाथाला दिसत होते की कालचक्र फिरत आहे. दर फेऱ्याला आपला आत्मा 'नव-कलेवरा'त प्रवेश करीत आहे. आतापर्यंत अशी अनंत कलेवरे होऊन गेली. भविष्यात पाहिले तो दृष्टी पोहोचेपर्यंत नवनव्या कलेवरांची मालिका दिसत होती. ह्या चक्रातून, नवनव्या देहांतून सुटका नाही का?
{{gap}}शेवटी महाप्रयाणाची रात्र उगवली. अवसेच्या रात्री विद्यापतीचे वंशज 'पति महापात्र' अनवसरघरात आले. शेजारच्या सेवायतांनी त्यांचे डोळे<noinclude></noinclude> 4dejm7ux724ma3g86gjxbqfoa6e50ep पान:Paripurti.pdf/96 104 20918 230159 71537 2026-05-19T06:32:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230159 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| ११० / परिपूर्ती}}</noinclude>बांधले व हाताला रेशमी फडके गुंडाळले. त्यांनी बलभद्राच्या, सुभद्रेच्या व जगन्नाथाच्या हृदयातले 'ब्रह्म' उर्फ प्राण काढून नव्या मूर्तीत घातले. नवकलेवरांचे- देव कसले? 'कलेवरे'... रथात बसवले व देवालयाच्या प्रांगणातच 'कैवल्य वैकुंठ' म्हणून देवाचे स्मशानस्थान आहे तेथे दयित सेवकांनी नेले. त्या कूपात रथाचे लाकडी घोडे, लाकडी सारथी व देवांची जीर्ण कलेवरे ठेवून त्यांवर माती टाकली. देवाच्या पुजाऱ्यांनी नव्या विग्रहांची गर्भगृहात स्थापना केली. देवळाच्या बाहेरील प्रचंड पटांगणात लाखो यात्रेकरू 'नव-कलेवर' दर्शनाची वाट पाहात बसले होते. सकाळी दारे उघडताच लक्ष कंठांतून 'जय ठाकूरजी!', 'जय जगन्नाथजी!' असा जयजयकार झाला तो कैवल्य वैकुंठाच्या गर्तेतील शेकडो पिढ्यांच्या कलेवरांना ऐकू गेला असेल. जगन्नाथ गोल डोळ्यांनी भक्तांकडे बघत होता. सुभद्रा आपल्या हारातील मणी मोजीत होती. बलभद्र सरळसोट ताठ उभा होता. सोन्या-रुप्याच्या दक्षिणेचा वर्षाव होत होता. मेलेल्या देवाचे सुतक दयित व सेवकांनी पाळले. मुक्तिमंडपात त्यांनी क्षौर उरकले, जुना स्वयंपाकाची भांडी फोडून नवी आणली, घरचा अग्नी विझवून नवा अग्नी आणला. भितरेछ रोजच्याप्रमाणे दरवाजे उघडायला आले, पण त्याच्या तोंडावर मृत्यूची कळा होती. नव-कलेवरांच्या ओसंडून चाललेल्या उत्सवाला त्याची दादही नव्हती व पर्वाही नव्हती.
{{gap}}जगात प्रत्यही हा 'नव-कलेवर' उत्सव चाललेला असतो. व्यक्ती मरतात, पण जीवजाती नव-कलेवर धारण करून अखंड असतात. शुद्ध जीवनातीत जुन्या व नव्या कलेवरांची भेटच होत नाही. कीटकांच्या बहुतेक जातींत 'नवयौवना'चा दिवस महाप्रयाणाचा ठरतो. कोशातून पतंग बाहेर पडतो व मादीच्या शोधार्थ उडू लागतो. मादीची गाठ पडली की, प्रेमाची मिठी मृत्यूचीच गाठ घालून देते. नर थोड्याच वेळाने मरतो व पक्ष्याच्या भक्ष्यस्थानी पडतो. नव्या पिढीच्या ओझ्याने भारावलेली मादी अंडी घालीपर्यंत जिवंत राहते व नंतर मरते. ही अंडी कधी पानावर, कधी झाडांच्या बुंध्यांत पोखरलेल्या भोकात, कधी चिखलाच्या घरात, तर कधी मेणाच्या बनलेल्या षटकोनी 'अनवसर' घरात असतात. जुनी पिढा मरून नवी जन्माला येईपर्यंत 'अनवसरा'चा काळ फार मोठा, असतो. वरच्या पायरीवरल्या जीवजातीत मात्र जुन्या कलेवरांना नवीनांना जन्मदेऊन लहानाचे मोठे करावे लागते. मनुष्याच्या बाबतीत तर नव्या-जुन्यांचे<noinclude></noinclude> qmrrvx3l2sxi2gafqha1c76j6f7bkr8 पान:Paripurti.pdf/97 104 20919 230160 71545 2026-05-19T06:35:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230160 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १११ }}</noinclude>साहचार्य लांबते. नव-कलेवरांचे शरीरच फक्त घडावयाचे नसून त्यात संस्कृतीचा आत्मा ओतायचा असतो. हे कार्य झाले म्हणजे जुन्यांना मरायची मोकळीक असते.
{{gap}}पण मरायची मोकळीक असली म्हणून मरायची तयारी थोडीच होते? आणि मरायची तयारी झाली तरी मरण हाकेसरसे का धावून येणार आहे? पूर्वकालीन वन्य समाजात जीवनाचा झगडा इतका तीव्र असे की, वयाच्या पन्नासाव्या वर्षांपर्यंत जगणारी माणसे नव्हतीच म्हटली तरी चालेल. आजही रानटी व भटक्या टोळ्या एक वस्ती मोडून दुसरीकडे निघाल्या की, वाटचालीतच म्हातारी-कोतारी मरून जातात व फक्त जवान नव-कलेवरे तेवढीच शिल्लक राहतात. पण नागसंस्कृतीने शेतीच्या जागेवर अन्नोत्पादन वाढविले, शरीराची दगदग कमी केली व मानवाच्या आयुष्याची मर्यादा शंभरापर्यंत जरी नाही तरी साठ-पाऊणशेपर्यंत वाढविली. अशा परिस्थितीत जुन्या म्हाताऱ्या पिढीने काय करावे असा प्रश्न येतो. एका शक्तीचा उदय झाला की दुसरी अस्तास जाते व अशा तऱ्हेने जगरहाटी नियमबद्ध चालू राहते हे सांगण्याचा कालिदासाला फार षौक आहे. सूर्य उगवतो व चंद्र अस्तास जातो हे त्याचे नेहमीचे, सर्वस्वी बरोबर नसलेले, उदाहरण आहे. मराठी कविता 'नेमिचि येतो मग पावसाळा' म्हणून सांगते; पण मनुष्याच्या दोन पिढ्यांच्या उदयास्ताचे चक्र असे नियमबद्ध नसते. ते नियमबद्ध करावे लागते व तो नियम काय हे कालिदासानेच वर्णन करून सांगितले आहे. रघुवंशाचे राजे बाळपणी शिकत असत, तारुण्यात विषयोपभोग घेत असत, म्हातारपणी संन्यासवृत्तीने राहात व शेवटी योगद्वारे शरीराचा त्याग करीत, असे तो रघुवंशाच्या पहिल्या सर्गात थोडक्यात सांगतो, व त्याच्या स्पष्टीकरणाकरिताच की काय, आठव्या सर्गाच्या आरंभी रघूचे वर्णन करतो ते फार महत्त्वाचे आहे. अजाने लग्नकंकण सोडायच्या आतच रघूने त्याला राज्याभिषेक केला, नंतर राज्यकारभार नीट होत आहे, शत्रूपासून भय नाही व प्रजा एकनिष्ठ आहे हे पाहून रघूने सर्व विषयांचा स्वर्गसुख— लालसेचासुद्धा- त्याग केला. तो अरण्यात निघालेला पाहून अजाने रडतरडत त्याच्या पायांवर लोळण घेतली व 'मला सोडू नका' म्हणून विनविले. रघूने पुत्राच्या बोलण्याला मान दिला पण परत लक्ष्मीचा अंगिकार केला नाही. त्याने नगराबाहेर एका आश्रमात वास केला व तेथे इतर योगी आणि संन्यासी यांच्याबरोबर चर्चा करून, यमनियमप्राणायामादींचा अभ्यास<noinclude></noinclude> 8d8flicvt93p1u5jrp2n0g1nt1gvqdm पान:Paripurti.pdf/98 104 20920 230161 71621 2026-05-19T06:43:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230161 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| परिपूर्ती / ११२}}</noinclude>करून, शेवटी समाधी घेतली. मुलाने आपल्या मरणाची वाट पाहात बसायचे किंवा बिंबिसाराने आपल्या दीर्घायुषी वृद्ध पित्याला मारले त्याप्रमाणे मुलाकडून मारून घ्यायचे ह्यापेक्षा आपल्या हाताने आपण सर्वस्वत्याग करायचा हा सर्वोत्तम मार्ग रघूने आचरणात आणला. सर्व तऱ्हेच्या भोगांचा संन्यास करावयाचा- राज्य, द्रव्य, स्त्री, सत्ता ज्याच्या ज्याच्यासाठी म्हणून मानव पूर्ववयात प्रयत्न करतो ते सर्व सोडून द्यावयाचे म्हणजे लौकिकष्ट्या मरणेच होय. जगणे ते फक्त 'कौतुकापुरते'च. असे झाले म्हणजे नव्या-जुन्या पिढीचा एकत्र सहवास सुखाचा व लाभाचा होतो; संस्कृतीच्या आत्म्याला नव-कलेवराची प्राप्ती होते. नाहीतर अक्षय आत्मा जीर्ण कलेवरात तडफडत राहतो. कलेवराच्या जीर्णत्वाने संस्कृतीच्या आत्म्याची प्रभा व प्रतिभा नष्ट होते; क्रियाशीलता, साहस व नवनिर्मिती जाऊन, अर्थशून्य बडबड व विकृत भोगलालसा मात्र शिल्लक राहून, सबंध समाजच रसातळाला जातो. मानव समाजात रघूची उदाहरणे फार थोडी, त्याउलट जास्त. आपल्याकडीलच सर्वांना माहीत असलेली ययातीची कथा अशाच एका सुखलोलुप जीर्ण कलेवराची आहे. ययातीचे मुलगे मोठे झाले, पण ययातीची राज्य व भोगलालसा कमी होईना. "तुमचे तारुण्य मला देता का?" असे त्याने विचारले. वरच्या मुलांनी स्पष्ट नकार दिला, धाकट्याने मात्र ते दिले अशी कथा आहे. ययातीला अजून काही वर्षे राज्य करायचे होते. मोठ्या मुलांना हा बेत पसंत नव्हता, म्हणून त्याने सर्वांना हाकून दिले. धाकटा पुरू अजून बाळ होता. तो वयात येईपर्यंत राजाला राज्य करण्यास अवसर मिळाला. तो वयात आल्यावर, भोग भोगून तृप्त झालेल्या व शिणलेल्या ययातीने त्याला राज्यावर बसवले अशी ही विलक्षण कथा आहे. रघुवंश हे एक काव्य आहे. काव्याच्याद्वारे कालिदासाने आपल्या सामाजिक मूल्यांचा आविष्कार केला आहे. एकएका राजाचे द्वारे एकएका मूल्याचे स्पष्ट चित्रण केले आहे. त्याचे राजे वास्तवातले नसून कवीच्या कल्पनासृष्टीतील होते. ह्याउलट, महाभारत एक इतिहास आहे. त्यात आलेल्या गोष्टी व प्रसंग वास्तव आहेत. मानवी मनाचा आविष्कार ध्येयवादी कवीने केलेला नसून जगात आहे तसा दाखविलेला आहे. ययातीचे चित्र मानव समाजात नेहमी आढळणारे आहे. त्याच ययातीचा वंशच शंतनु देवव्रताला राज्य देऊन संन्यास घेण्याऐवजी सत्यवतीच्या तारुण्याला भुलला व त्यामुळेच भारतीय युद्ध उदभवून कुलक्षय झाला हीही कथा सर्वांना माहीत आहे. आपली<noinclude></noinclude> 3p0hgewytth52npll0hdx5o9nfo3fdw पान:Paripurti.pdf/99 104 20921 230162 71626 2026-05-19T06:46:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230162 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / ११३ }}</noinclude>सध्याची पिढी ययातीच्या प्रकृतीची आहे. गरीबगुरिबांना मरेपर्यंत पोटाची खळगी भरण्यासाठी संसारात राहावे लागते. त्यांना विषयनिवृत्त व्हावयाचे म्हणजे आत्महत्याच करावी लागेल; पण इतरही सर्व कितीही वय असले तरी मोठ्या आसक्तीने जगात वावरत असतात. "मा गृध्रः कस्यचित धनम ॥" हा उपदेश फक्त धनाच्या चोरीपुरताच नाही, सर्व तऱ्हेच्या चोरीबद्दल आहे. द्रव्याची चोरी क्षुल्लक आहे, पण दुसऱ्याच्या आयुष्याची चोरी भयंकर आहे व ती सर्व तऱ्हेने, सर्व काळ आजच्या जगात चालली आहे. स्वतःच्या संसाराचा पसारा एवढा थोरला मांडून ठेवायचा की, वानप्रस्थाश्रमाची गोष्टच दूर, पण मरताना म्हातारपणाचे मूल दोन-चार वर्षांचे असावयाचे व थोरल्या मुला-मुलींचा जन्म बापाचा संसार आवरण्यात जायचा हे दृश्य कितीतरी कुटुंबात दिसते. वयाची ४०-४५ वर्षे बापाच्या संसारापायी घालविली म्हणजे वेळीच न मिळालेल्या सौख्याच्या आशेने अशी एखादी बाई वा पुरुष अवतीभोवती बघून दुसऱ्याच्या संसारावर दरोडा घालू पाहतात. जुन्या चोरीतून नव्या चोरीचा उगम होतो. जुन्या-नव्या पिढीत सत्तेचे, अधिकाराचे, सौख्याचे संक्रमण सुरळीत न होता दरोडेखोरीच्या वृत्तीने होऊ लागते.
{{gap}}मुले व सुना मोठ्या झाल्या आहेत, त्यांना कुटुंब कसेही चालवू दे, आपण आता ह्या सर्वांतून मन काढून 'कौतुका'पुरते राहावे असे फार थोड्यांनाच वाटते. नव्या पिढीला जुनी पिढी कधी एकदा जाईल असे होते. जुनी पिढी आपले मानाचे व सत्तेचे स्थान सोडण्यास तयार नसते. मग निरनिराळे कायदे व नियम करून कोणाला वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी तर कोणाला साठाव्या वर्षी सक्तीने 'सेवा (!)निवृत्त' करून सत्तासंन्यास घ्यायला लावतात व तेढीच्या वातावरणात नव-कलेवर स्थापना होते. एकीकडून सेवानिवृत्त झाले की, आपल्या बुद्धीचा व अनुभवाचा लिलाव राजरोसपणे सुरू होतो. खाऊनपिऊन सुखी असूनही म्हातारपणी आपल्या परिपक्व ज्ञानाचा फायदा समाजाला निरपेक्षपणे देणारे महात्मे विरळाच. ही झाली सामान्य माणसांची गोष्ट; पण ह्याहीवरच्या वर्गाची दशा तर सर्वस्वी ययातीचीच आहे. कार्यक्षम झालेल्या खालच्या पिढीच्या कर्तबगारीला मुळी वावच मिळत नाही. अशा तरुणांना एकामागून एक हाकलून देण्यात येते व जीर्ण कलेवर व अतिजीर्ण कलेवरे आपल्या जगन्नायकपदाला चिकटून बसतात. अनुयायांनी केलेला जयजयकार ऐकल्याशिवाय त्यांचे कान तृप्त होत नाहीत. हजारो भक्त समोर गोळा झालेले पाहिल्याशिवाय त्यांना चैन<noinclude></noinclude> huu4axqc5aeemqnhpqpaspw7cwobkfu पान:Paripurti.pdf/100 104 20922 230163 71628 2026-05-19T06:47:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230163 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| ११४ / परिपूर्ती}}</noinclude>पडत नाही, अधिकार व सत्ता, मानपत्रे व पुष्पहार त्यांना सोडवत नाहीत. एका अधिकारपदाचा त्याग केला की दुसरे ठेवलेलेच असते. सत्तासंक्रमण शांततेने न होता भीषण यादवीनेच होणार काय? ह्या जगन्नाथमंदिरात अधिक, आषाढ मुळी उगवणारच नाही का?
{{right|{{xx-larger|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude> tisc4n36zz1hrdacecgtibo89eme4u1 पान:Paripurti.pdf/102 104 20924 230164 71634 2026-05-19T06:54:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230164 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|११६ / परिपूर्ती}}</noinclude>जीवांच्या अनंत तोंडांनी शोषण होऊन क्षीरोदधी कोरडा पडण्याची वेळ आलेली असते. एकावर एक जिवांचे थरचे थर रचल्यासारखे झाले आहेत, खालचे जीव हालचाल न करता आल्याने गुदमरून जातात, तर वरच्यांचे अंग कोरडे पडून ते सुकून जातात. अशी परिस्थिती काही वेळ राहू दिली तर तबकडी पार कोरडी पडून सर्व जीव मरून जातील. पण प्रयोगशाळेतील विद्यार्थी अर्धा चमचा गोड पाणी किंवा अन्नरस तबकडीत टाकतो. शेवटच्या काही मिनिटांतील भयानक जीवनकलहातून जिवंत राहिलेले चार-दोन जीव हालचाल करू लागतात; स्वबांधवांच्या मढ्यांनी अधिकच पोषक बनलेल्या नव्या जीवनरसाचे शोषण करतात; युगचक्राला व निर्मितीला परत जोमाने सुरुवात होते. जोपर्यंत सर्वांना पुरेसे अन्न मिळते, तोपर्यंत संख्येची वाढ झपाट्याने यंत्रासारखी चालते; पण अन्नरस कमी व जीव जास्त अशी स्थिती झाली की, निरनिराळ्या तबकड्यांतील जीवांची हालचाल पाहण्यासारखी असते. पहिल्याने एकमेकांना ढकलण्याची धडपड सुरू होते- त्यात बरेच मरून तबकडीत पुरेशी जागा झाली की थोडा वेळ परत शांततेने प्रजनन चालू होते, पण त्यातही पूर्वीचा सुरळीतपणा दिसून येत नाही. विशेषतः तबकड्यातील सूक्ष्म जीव बहुपेशीमय असले तर बदललेल्या परिस्थितीचा परिणाम त्याच्यावर चटकन दिसून येतो. काही साश्य कारण नसता एकदम सर्व जंतू सैरावरा पळू लागतात, एकमेकांवर आदळतात, चिरडतात व मरतात. जणू तबकड्यातील सर्व जीवांना भुताटकीने झपाटलेले आहे अशा त्यांच्या हालचाली असतात. कधीकधी सर्व जीव काही हालचाली न करता मृतमय स्थितीत पसरलेले दिसतात. त्यांचे जीवन घड्याळासारखे सुरळीत न चालता त्यात काहीतरी उलथापालथ होतेसे पाहणाराला वाटते. प्रयोगशाळेत काही तबकड्यातून दर तासाने जीव काढून दुसऱ्या तबकड्यात ठेवतात व नवा अन्नरस देतात. अशा जीवांची संख्या वाढतच असते. हवा, योग्य उष्णता व भरपूर अन्न यांचा त्यांना पुरवठा असतो. बाहेरचे शत्रू नाहीसे झालेले असतात. अंतःकलाहाची परिस्थिती येण्याच्या आतच नवे अन्न व नव्या तबकड्या वसाहतीसाठी मिळत जातात व सारखी न थांबता जीवांची संख्या वाढत जाते. मरण जणू आपले कार्य विसरून गेलेले असते. ह्या कृत्रिम सृष्टीत जननाचीच काय ती परवानगी असते.
{{gap}}"अशा प्रकारचे हे जीव वाढायला लागले तर थोड्या महिन्यात पृथ्वी व्यापून टाकतील!" एक विद्यार्थी सूक्ष्मदर्शकातून पाहता पाहता उदगारला.<noinclude></noinclude> fyarg898prxe1scbe4i2knsnrdm8twt पान:Paripurti.pdf/103 104 20925 230165 71638 2026-05-19T06:58:28Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230165 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / ११७}}</noinclude>शिकवणारे अध्यापक जणू ह्याच संधीची वाट पहात होते. ते म्हणाले, "अगदी बरोबर; पण सृष्टीमध्ये जीवांच्या वाढीला काही सर्व गोष्टी अनुकूल नसतात. ज्या डबक्यातून ह्या प्रयोगशाळेत पहिले जीव आणले ती उन्हाळ्यात वाळली की कोट्यवधी जीव मरून जातात. सांदीकोपऱ्यात थोड्याशा चिखलात काही जिवंत राहतात. खूप थंडी पडून पाणी गोठले तरी बरेच जीव मरतात. पाण्यात काही विषार गेला तरी मरतात. जीवोत्पत्ती जास्त होऊन डबक्यातील पाण्यात पुरेसा अन्नरस राहिला नाही तरी लाखोंनी मरतात आणि शेवटी म्हणजे दुसरे निरनिराळे सूक्ष्म जंतू ह्या डबक्यातील जावाना खायला टपलेले असतात." त्यांनी लगेच गड्याकडून एक बादली आणली व तीतले थोडे थोडे पाणी नव्या तबकड्यात घालून वर्गाला परत सूक्ष्मदर्शकातून पाहण्यास सांगितले. आता तबकडीत फक्त अन्नरस व त्यावर पोसणारे एक-दोन जीव असे दृश्य नव्हते. तबकडीत नाना तऱ्हेच्या सूक्ष्म वनस्पती व प्राणी पाण्यात इकडून तिकडे फिरत होते. काही खाऊन खाऊन लठ्ठ होत व नंतर नवी जीवोत्पत्ती होई. पण खाणे थोडे म्हणून जीवोत्पत्ती भराभर न होता फारच सावकाशीने होत होती. तेवढ्यात दुसराच एक सूक्ष्म जीव येऊन त्याने नव्या प्रजेला खाण्यास सुरुवात केली व नव्यानेच जन्माला आलेल्या त्या अणुमय जीवांची पळायची धडपड सुरू झाली. त्या जीवभक्षक जीवाला खाणारेही जीव त्या तबकडीत होते. शिवाय, एकमेकांना खाऊन भक्ष्य संपले म्हणजे भक्षकही उपासमारीने मरायच्या पंथाला लागे आणि शेवटी पाहता-पाहता तबकडीतले पाणी संपले की, सगळ्याच जीवांची धडपड बंद पडायची- तबकडीतल्या विश्वावर मृत्यूची शांतता पसरायची.
{{gap}}त्या प्रयोगशाळेतले प्रयोग मोठ्या प्रमाणावर डोळ्यांपुढे चाललेले आज दिसत होते- पुरुष-बाया येऊन आपली तपासणी करून घेऊन व विचारल्या प्रश्नांची उत्तरे देऊन पुढे चालले होते. "उंची चार फूट अकरा इंच; पाच फूट तीन इंच..." एक माणूस उंचीची मापे सांगत होता; "वजन अठ्याऐशी पौंड; शहाण्णव पौंड: एकशे एक पौंड..." शंभरावर वजन ऐकले की लिहून घेणारा डोळे वर करून, "आहे तरी कोण पैलवान!" अशा बुद्धीने वर पाही. छातीचा घेर, श्वासोच्छवासाचा जोर, स्नायूचा जोर अशी एक-एक तपासणी होत होती. ती झाली म्हणजे 'लग्न कधी झाले; मुले किती झाली? मेली किती? जिवंत किती?' अशी प्रश्नावली सुरू होई. वयाप्रमाणे<noinclude></noinclude> 7kdgirx6pk8t59bu9ehzuy5e0v3keyq पान:Paripurti.pdf/104 104 20926 230166 71643 2026-05-19T07:01:39Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230166 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| ११८ / परिपूर्ती}}</noinclude>कोणाला पाच, दहा, कोणाला बारा मुले झालेली आणि त्यांतील निम्मीशिम्मी जिवंत हे उत्तर यावयाचे! ह्या कृश, अर्धपोटी जीवांना एवढी मुले होतात तरी कशी? त्यातून ते जिवंत तरी कसे राहतात? पुरुषांचा ७० - ७५ रुपये पगार एवढ्या संसाराला पुरतो कसा? हे सर्व लोक खातात तरी काय?... अशी परिस्थिती असूनही त्या प्रांतातील लोकसंख्या सारखी वाढत होती. किनाऱ्यावरचे काम संपवून आम्ही पुढे निघालो. दुपारी बारा वाजतासुद्धा सूर्याचा प्रकाश संध्याकाळसारखा वाटत होता. अशा अरण्यातून जाता जाता मध्येच एक मोठा मोकळा प्रदेश दिसला. प्रचंड वृक्षांचे जळके बुंधे तेवढे उरले होते. बायका-पुरुष तेही खणून टाकायच्या उद्योगात होते. जरा पुढे गेलो तर जंगल जाळून साफ केलेल्या जागेत नवी शेती झाली होती. कोठे बटाटे व टापिओकाचे पीक लावले होते. किनाऱ्याजवळ शेतीत माणसांची पोटे भरत ना म्हणून सरकार पर्वतराजीवरील जंगले कापून शेतकऱ्यांना लागवडीसाठी नवीन जमीन देत होते. वाढत्या तोंडांची भूक भागवायची असा पण केला तर त्रावणकोरमधली अरण्ये साफ होऊन तेथे पूर्व महाराष्ट्रातल्यासारखे उघडेबोडके डोंगर दिसू लागायला एक शतकाचासुद्धा अवधी नको.
{{gap}}फक्त त्रावणकोर-कोचीनच्या तबकड्यांतून जीव वाढताहेत असे नाही. ह्या प्रयोगशाळेत ठिकठिकाणी अशा तबकड्या आहेत व त्यातून सर्व तऱ्हेचे जीव भराभर वाढत आहेत. पुरी जिल्हा व चिल्का सरोवर ही डोळ्यांनी पाहावयास पृथ्वीवरील स्वर्गासारखी आहेत. पुरी जिल्हात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असंख्य जलसंचयांवरून कमळाच्या पानांचे दाट आवरण असते व त्यांत निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, तांबड्या रंगांची कमळे उगवलेली असतात. जसे रंग विविध तसे आकार पण विविध. बचकेत मावणार नाही एवढ्या मोठ्या कमळापासून तो सदाफुलीच्या फुलाएवढी चिमुकली कमळे त्या पाण्यात चमकत असतात. कमळ्यांच्यामागे हजारो एकर जमिनीवर भाताचे पीक डोलत असते. आश्विनाच्या महिन्यात ते इतके दाट असते की, हिरव्या-पिवळ्या गालिच्यात मुळी फटसुद्धा दिसत नाही. मध्ये खंड असलाच तर आंबा, केळी, पुन्नाग व नारळीच्या बागांचा. चिल्का सरोवराचे काठी भातशेती व बागाईत तर आहेच; पण शिवाय सरोवरात मासे उत्तम मिळतात व ते ताजे मिळावे म्हणून लोक मुद्दाम सुटीत येथे येऊन राहतात. चिल्काच्या अथांग जलाशयावर सूर्योदय अतिरम्य<noinclude></noinclude> da2mqoyygc52z5gpwjcpqm6ykixvhtg पान:Paripurti.pdf/105 104 20927 230167 71648 2026-05-19T07:04:51Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230167 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / ११९}}</noinclude>वाटतो. दुपारच्या उन्हात तळपताना दृष्टी ठरत नाही, पण ते सुरेख दिसते व संध्याकाळच्या सावल्या दाटू लागल्या म्हणजे सरोवरावरून हजारोंच्या थव्यांनी पक्षी उडत काठाशी असलेल्या घरट्यात जातात तेव्हा तर क्षणाक्षणाला बदलणाऱ्या काळोखणाऱ्या सरोवराच्या काठांवरून हलूच नयेसे वाटते. पण अधाशीपणे ही दृश्ये पिणाऱ्या डोळ्यांना प्रायश्चित्तही लगेच मिळते. कोणी नवीन पाहुणे आले ह्या कुतूहलाने खेड्यातील माणसे गोळा झाली होती. त्यांच्या वाढत्या गलबल्यामुळे लक्ष वेधून मी सरोवराकडची नजर काढून मागे वळले. वीस-पंचवीस माणसे होती, पण त्यातील फार तर निम्मी अव्यंग होती. कोणाची बोटे गेलेली, कोणाच्या पायांचे नुसते खुंटच, कोणाची नाके किंवा कान सडलेले, अशी होती. उडिशाच्या सरकारने माझ्याबरोबर एक तद्देशीय मदतनीस दिला होता, त्याला मी विचारले, "ह्या गावात महारोग्यांची वसाहत आहे वाटते?"
{{gap}}"नाही. चिल्का सरोवराच्या भोवतालच्या खेड्यापाड्यांतून महारोगाचा फार प्रसार आहे."
{{gap}}त्याच्या म्हणण्याचे प्रत्यंतर दोन-चार दिवसांच्या पाहणीत आलेच. रोग अंगात शिरल्यापासून त्याची लक्षणे शरीरावर दिसायला बारा वर्षे लागतात म्हणे; पण मला तर कित्येक महारोगी मुले दिसली! मला त्या वेळी तरी त्यांचे वय बारांपेक्षा कमी वाटले. मग काय गर्भातच त्यांना संसर्ग झाला होता की, मुले मोठी असूनही वाढ खुंटल्यामुळे लहानखोरी दिसत होती कोण जाणे! महारोगी नाही असे एकही झोपडे नव्हते. रोगी निरोगी सगळे एके ठिकाणी राहावयाचे, जेवायचे व झोपायचे. प्रत्येक झोपड्यात पाच-पाच, दहा-दहा मुले होती. उष्ण हवेमुळे कपड्यालत्त्यांची फारशी जरूर नव्हती. जमिनीत भाताचे पीक भरपूर येते. सरोवरात बारमास मासे मिळतात. शेजारच्या जंगलात शिकार व लाकूड मिळते. सृष्टी अनंत हस्तांनी देते आहे, लोकसंख्या वाढत आहे व त्याबरोबरच रोग्यांची संख्याही वाढते आहे. ह्या तबकडीत महारोगी किती भराभर वाढू शकतात ह्याचा प्रयोग चालला आहे.
{{gap}}पुरीला जाताना असेच झाले. प्रत्येक खेड्यापाड्यातून आणि विशेषतः क्षेत्राचे ठिकाण म्हणून पुरीला इतके लोक हत्तीरोग झालेले पाहिले की, कधी येथून सुखरूप बाहेर पडते असे झाले. धडापेक्षाही हात व पाय पाहिले म्हणजे दर वेळी घृणा, भीती व अनुकंपेने मन पिळवटून निघावयाचे. उडिशाच्या सबंध पूर्वपट्टीत ह्या लोकांच्या पैदाशीची प्रयोगशाळा आहे.{{nop}}<noinclude></noinclude> cl3kk19boydvconq4nmlp7x8dwtaoaq पान:Paripurti.pdf/106 104 20928 230168 71652 2026-05-19T07:07:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230168 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १२० / परिपूर्ती}}</noinclude>{{gap}}पण उडिशाच का, सगळ्या भारतात, सर्व प्रांतातून आज अधिकाधिक वाढ कसली होत असेल तर ती माणसांची.
{{gap}}काही वर्षांपूर्वी एक भिकारीण व तिची तीन मुले लहान मुलांच्या कोर्टापुढे आली होती. मुलांची आई वेडी होती. तिचे आईबाप, भाऊ, नवरा, कोणी आप्तेष्ट चौकशी करून आढळले नाहीत. वेडी म्हणजे चिंध्या चिवडणारी नव्हे... पण अर्धवट. कोर्टामध्ये तिने वारकऱ्याचे अभंग म्हणून कीर्तनकारांच्या शैलीने जीवनाचे असारत्व, पंढरीचे माहात्म्य, संतांचा त्याग व निःस्पृहपणा ह्यावर आम्हाला चांगलेच प्रवचन दिले. मुले पोसणे तिला शक्यच नव्हते म्हणून सरकारने ती ताब्यात घेतली. चार वर्षांनी पाहते तो परत तीच वेडाबाई एक मूल हाताशी व एक स्तनाशी धरून कोर्टात उभी! गोड हसून तिने मला सांगितले, "तुम्हाला द्यायला आणखी दोन आणली आहेत!"
{{gap}}वेडी-शहाणी, लुळी-पांगळी, रोगी-निरोगी, गरीब-श्रीमंत सर्वांच्या हातून लोकसंख्येत सारखी भर पडते आहे. तिसाचे चाळीस कोटी झाले, आता ह्या वर्षांच्या शिरगणतीत आणखी कितीची भर पडते म्हणून सर्व जग कुतूहलाने भारताकडे पाहत आहे.
{{gap}}भारतासारखे काय इतर देश नाहीत का? चीनही अत्यंत दाट वस्तीचा प्रदेश आहे असे ऐकतो. तेथेही लोकसंख्या वाढतच असणार. चीन काय किंवा इतर काही देश काय; लोकसंख्या दाट खरी, पण तिची वाढ भारताइतकी झपाट्याने होत नाही. ह्याचे कारण म्हणजे एका ऐतिहासिक घटनेमुळे. जिवाच्या पैदाशीसाठी लागणारी परिस्थिती भारतात गेल्या शतकात जशी निर्माण झाली तशी इतरत्र कोठेही आढळत नाही.
{{gap}}इंग्रज यावयाच्या आधीचा महाराष्ट्राचाच इतिहास घ्या ना! अठ्ठावन्न सालचे बंड, पेंढाऱ्यांचा उपद्रव, दुर्गादेवीचा दुष्काळ, पानिपतच्या लढाया, निजामाशी लढाया, कर्नाटकातील लढाया, शिवाजी व राजाराम ह्याच्या वेळचे सतत पावशतकाचे स्वातंत्र्ययुद्ध ह्यात सारखी माणसे मरत होती. मूल होण्याच्या वयाच्या तरुण पोरी विधवा होत होत्या. प्रजोत्पत्तीला आळा बसत होता. मराठी इतिहासाचे एक गाढे विद्वान असे सांगतात की, "औरंगजेबाच्या फौजेत असलेले तरुण जवान म्हातारे होऊन दिल्लीला पोचले व सर्व उमेद रणांगणावर गेल्यावर कित्येकांचे निर्वंश झाले असे एका जुन्या बखरकाराने लिहिले आहे." ही परिस्थिती जेत्यांची तर खुद्द ज्यांच्या<noinclude></noinclude> 02b5ubersialzmkmg6q5renxbsl7v6i पान:Paripurti.pdf/107 104 20929 230169 71657 2026-05-19T07:13:07Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230169 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १२१ }}</noinclude>भूमीवर युद्ध चालले होते, त्यांच्या कुटुंबांची किती धूळधाण झाली असेल त्याची कल्पनाच केलेली बरी. त्याच्याही मागे गेले तरी मुसलमान राजवट, यादव, राष्ट्रकूट, चालुक्य, शातवाहन, अगदी ख्रिस्त शकाच्या पूर्वीपासूनचा इतिहास म्हणजे दोन हजार वर्षांच्या लढायांचा व राज्यक्रांत्यांचा इतिहास आहे. महाराष्ट्र इतरांशी लढत होता व इतर महाराष्ट्राशी लढत होते. सर्व भारतभर राष्ट्राराष्ट्राचे लढे चालले होते. लढाई, अशांतता, झगडा ही राष्ट्रांची नेहमीची प्रकृती होती व दीर्घकालीन शांतता हीच विकृती होती. जी लढाईत मरत नसत अशा अर्भकांना पटकी, देवी, उपासमारी घेऊन जात. पण इंग्रजांच्या राज्यापासून ही स्थिती पार बदलली. सबंध देशभर शंभर वर्षांवर शांतता नांदली; पेंढारी वगैरे लुटारूंचा नायनाट झाला. अंतर्गत युद्धे मुळीच नव्हती व बाहेरचे वैरीही नव्हते. अशी राजकीय परिस्थिती संबंध मानवेतिहासात पूर्वी कधी कोणत्याही राष्ट्राला मिळाली नाही. पाश्चिमात्त्यांच्या वैद्यकीय ज्ञानात जी भर पडली तिचा फायदा आपोआपच भारताला मिळाला. सबंध गावेच्या गावे निर्मनुष्य करणाऱ्या पटकी, देवी वगैर रोगांवर ताबडतोब इलाज होऊ लागला. पोस्टाच्या सोयीने एका प्रांतात जे काय चालले असेल त्याची बातमी थोडक्या वेळात दुसऱ्या प्रांताना मिळू लागली. आगगाड्यांमुळे इकडचे धान्य तिकडे हालवता येऊ लागले. हिंदुस्थानात दरवर्षी कोठे ना कोठे तरी अतिवृष्टीमुळे वा अनावृष्टीमुळे दुष्काळ हा असतोच; पण इंग्रजांच्या वेळेपासून एका प्रांतातले धान्य दुसरीकडे जाऊ लागले व दुष्काळामुळे होणारे मृत्यू बरेचसे टळले. बालमृत्यूचे प्रमाण मोठे असले तरी पूर्वी तरुण पुरुष लढाईत, साथीत किंवा दुष्काळात जे बरेचसे मरत ते मरेनासे झाले. शांततेमुळे स्त्रियांना व कुटुंबांना स्वास्थ्य लाभले व प्रजोत्पादनाच्या मार्गातील सर्व आडकाठी दूर होऊन मृत्यूचे मार्ग मात्र बरेचसे बंद झाले. भारताच्या बहुतेक विभागांचे हवापाणी असे आहे की, वस्त्रप्रावरण फारसे नसले तरी चालते. घरेही अगदी तुटपुंजी असली तरी तेवढा निवारा पुरतो व अशा भूमीवर प्रजोत्पादनाची प्रयोगशाळाच जणू स्थापन झाली.
{{gap}}इंग्रजांच्या राज्यस्थापनेपासून आतापर्यंत भारताची भूमी तितकीच राहिली... नव्हे, फाळणीमुळे संकोचच पावली आणि प्रजा मात्र दुप्पट झाली. कोणालाही ती फार झाली असे वाटत नाही, वाटत असले तरी कोणी तसे बोलत नाही. कारखानदारांना वाटते. जेवढी जास्त लोकसंख्या तेवढी मजुरांची<noinclude></noinclude> gqnqio7qrxhtbkfyzt3bj0dxtzz8pte पान:Paripurti.pdf/108 104 20930 230170 71659 2026-05-19T07:15:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230170 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १२२ / परिपूर्ती}}</noinclude>संख्या जास्त व पगार कमी. हिंदूंना वाटते, मुसलमान वाढत आहेत, आम्ही का नको? रोमन कॅथॉलिकांनी तर जास्तीत जास्त प्रजोत्पत्ती करून जगच व्यापण्याचा चंग बांधला आहे. त्यांच्या सर्व भाषांतील वर्तमानपत्रांतून व मासिकांतून मोठ्या कुटुंबाचे फायदे वर्णन करणारे लेख येत असतात. मजूर पुढाऱ्यांना वाटते, जितकी खायला तोंडे जास्त तितकी उपासमार जास्त, जितकी उपासमार जास्त तितकी अशांतता व क्रांतीची बीजे पेरण्यास योग्य भूमी; म्हणून तेही लोकसंख्येबद्दल बोलत नाहीत. शिवाय, लोकशाहीच्या काळात एका माणसाला एक मत असते व ते आंधळ्या, लुळ्या, रोगी, मरणप्राय माणसाचे असले तरी त्यांची किंमत एकाच मताची. म्हणून निरनिराळ्या पक्षांना व धर्मांना आपल्या पक्षाची, धर्माची वा जातीची लोकसंख्या जास्तीत जास्त हवी असते. चालत्या प्रेतांनी मते दिली तरी त्यांना चालेल, पण ती मिळावीत ही त्यांची धडपड. कोणी अधिक धान्य पिकवा सांगते, कोणी धान्याची भीक मागत जगभर हात पसरते, कोणी सभासभातून ब्रह्मचर्याची तोड सुचवतात आणि इकडे जीवोत्पादन झपाट्याने होतच आहे.
{{gap}}अन्नरसाचा क्षीरसागर आटत चालला आहे. अर्धपोटी जिवांचे त्राण नाहीसे होत चालले आहे. भारताच्या असंख्य तोंडात घास भरवील अस कोणाही राष्ट्राचे आज सामर्थ्य नाही. क्षीरसमुद्र आटला की बहुतेक जीव तडफडून मरतील. असंख्य मढ्यांनी खतावलेल्या भूमीवर परत जोरात अन्नोत्पादन होईल. अल्प स्वल्प राहिलेल्या जीवांना परत जगण्या- वाढण्याला योग्य परिस्थिती मिळेल व परत नव्याने प्रजोत्पादनाचा प्रया' सुरू होईल.
{{right|{{xx-larger|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude> 3vixbk91vw1adg9fl6aejf488yi5k79 पान:Paripurti.pdf/110 104 20932 230171 71674 2026-05-19T08:12:46Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230171 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १२४ / परिपूर्ती }}</noinclude>चीज करणाऱ्या धर्माची मी. ख्रिस्त हा एकच प्रेषित व त्याचा धर्म सर्वांनी स्वीकारावा असा तिचा अट्टाहास तर कोणी कोणत्या का धर्माचा असेना, मला काय त्याचे, अशी माझी वृत्ती. खरे पाहिले तर तिचा धर्म तिच्याजवळ व माझा धर्म वा मते माझ्याजवळ. दोघींना एकत्र काम करण्यास काहीच हरकत नव्हती. पण हळूहळू आमचे जमेनासे झाले एवढे मात्र खरे.
{{gap}}त्यांच्या चर्चची एक कार्यकारी बाई होती. तिचे कार्य म्हणजे तिला नेमून दिलेल्या वस्तीतील घरांवर नजर ठेवायची, त्यांच्या घरी वेळीअवेळी जाऊन कुटुंबातील माणसे काय करतात ते पाहून ती बातमी पाद्ऱ्याला कळवायची. लहान मुलांचे कोर्ट म्हणजे ख्रिस्ती चर्चचा एक विभाग अशी तिची समजूत होतीसे दिसले. दर आठवड्याला ती निरनिराळी मुले कोर्टात आणायची- कोणाचा बाप दारू पितो म्हणून, कोणाची आई भटकते म्हणून, कोणाचे आईबाप भांडतात म्हणून. ह्या हेरगिरीबद्दल दरवेळी तिला माझ्या सहकारिणीकडून शाबासकी मिळे. मी मात्र दरवेळी ह्या खटल्याबद्दल भांडत असे. "अहो, पुण्यात अशा तऱ्हेने घरोघर हिंडले तर इतकी मुले कोर्टात खेचावी लागतील की, १०० मॅजिस्ट्रेट व ५० कोर्ट मिळूनही काम संपणार नाही. का अशा भानगडी तुम्ही आणता?" तिला ते कधी पटायचे नाही. एक दिवस एक जोडपे व एक मुलगी ह्या कार्यकारी बाईने आणला. मी विचारले, "भानगड काय? मुलीला मारझोड होते, का अन्न मिळत नाही, का तिने गुन्हा केला?" "ह्यापैकी काहीच नाही." कार्यकारी बाई म्हणाली, "पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार आहे. ह्या गृहस्थाचे नाव जोसेफ, ही बाई सेरा, ही दोघेजण अमक्या घरात राहतात व त्यांना हे सात वर्षाचे लेकरू आहे." नंतर ती माझ्यापुढे वाकली व पुटपुटली, "अहो, त्या दोघांचे लग्न झाले नाही!" तिचे सर्वांग शहारले. मी माझ्या सहकारिणीकडे पाहिले, तिचेही तोंड अगदी गंभीर दिसत होते. खटल्यातील इसमाला पुढे बोलावून मी विचारले, "काय हो, किती वर्षे तुम्ही सध्याच्या घरी राहता?" "पाच वर्ष?" "मुलगी कितवीत आहे?" "तिसरीत." "पगार पोटापुरता मिळतो ना?" "हो." "काही कर्जबिर्ज?" "मुळीच नाही." बाईला विचारले. तिने सांगितले की, "आमचा भांडणतंटा काही नाही." "मग ह्या पोरीला आणले तरी कशाला इकडे?" मी त्रासून सहकारी मॅजिस्ट्रेटला विचारले, तर ती मला म्हणते, "म्हणजे? ह्या कोवळ्या निष्पाप अर्भकाला अशा पातकाच्या खाईत राहू द्यावयाचे की काय! बिनलग्नाच्या अपवित्र<noinclude></noinclude> 6eup4ao52qesxswr80cn25rayh1dihb पान:Paripurti.pdf/111 104 20933 230172 71676 2026-05-19T08:16:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230172 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १२५}}</noinclude>संबंधापासून पापात जन्मलेले हे पोर आता अशा घरात राहणे योग्य नाही. छे! छे:! तिला सरकारने ताब्यात घेऊन आमच्या मिशनच्या बोर्डिंगात ठेवावे. तो माणूस आमच्या मिशनच्या पंथाचाच ख्रिस्ती आहे. पाच वर्षे तो मिशनशेजारीच राहतो व आमच्या चर्चमध्ये येतो आहे; काय लबाड आहे तो! आज त्याच्या गावची बाई आली होती; तिने सांगितले की, त्याचे लग्न झाले नाही म्हणून." आता मी पण हट्टाला पेटले. "मी हा खटला हातात घेणार नाही. ज्या घरी मूल आहे तेथे त्याचे पालनपोषण नीट होत आहे. आईबाप निर्व्यसनी व सुस्वभावी आहेत. केवळ त्यांचे लग्न झाले नाही ह्या भानगडीशी मला कर्तव्य नाही. तुमच्या चर्चतर्फे त्याच्याविरुद्ध काय इलाज करायचा तो करा, पण हिंदी सरकारने लोकांच्या घरी जाऊन त्यांच्या संसारात लुडबूड करायला मुलांचे कोर्ट नेमले नाही." मी निक्षून सांगितले. "दुसरे, तुमची कार्यकारिणी काही कोर्टाची ऑफिसर नव्हे; तिने परत येथे येता कामा नये." शेवटी दोन-तीन तासांच्या हुज्जतीनंतर ती केस काढून टाकली, पण आमची मने एकमेकांविषयी कलुषित झाली ती कायमची. तिला वाटे, मला नैतिक दृष्टिकोन व धार्मिक भावनाच नाहीत. मला वाटे ते थोडक्यात सांगण्यासारखे नाही, पण ती व तिची कार्यकारिणी अशा दोघीजणी जेव्हा निरनिराळ्या कुटुंबातील भानगडींबद्दल बोलायच्या तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची हावरी उत्सुकता पाहन मला शिसारी येई एवढ मात्र खरे.
{{gap}}एकदा आमच्यापुढे एक जरा गुंतागुंतीचा खटला होता. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून नेल्याबद्दल एका तरुण वेश्येवर खटला होता. त्या वेश्येने आपल्या वतीने बॅरिस्टर दिला होता. तिच्यावर गुन्हा शाबीत होणे कठीणच होते. कारण तिच्याविरुद्ध साक्ष द्यायला कोणी तयार नव्हते. ज्या पोरीला सोडवून आणली होती ती इतकी भेदरलेली होती की, ती कोर्टापुढे आली की, त्या वेश्येला व तिच्या साथीदारांना पाहून थरथरा कापायची. पोलिसांना ती बाई जामिनावर सोडायची नव्हती. दुसऱ्या दिवशीच्या साक्षी होईपर्यंत ताब्यात ठेवायची होती. बाईला चोवीस तासांपुरते जामिनावर सोडावे म्हणून बॅरिस्टर कोर्टाची विनवणी करीत होते. ती आपली विडा चघळीत मजेत उभी होती. क्षणाक्षणाला क्लार्क, प्रोबेशन ऑफिसर व मॅजिस्ट्रेट ह्यांच्याकडे बघून मंद हास्य चालले होते तिचे. बॅरिस्टरचे म्हणणे होते की, पोलीस बाईला वाईट वागवतील, बाईमाणूस<noinclude></noinclude> 3r8hi3qwjnnqlxdfs1nuhhjemojzb7h पान:Paripurti.pdf/112 104 20934 230173 71681 2026-05-19T08:18:44Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230173 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१२३ / परिपूर्ती}}</noinclude>त्यांच्या ताब्यात जाणे बरे नव्हे, वगैरे. इतक्यात खोलीच्या एका कोपऱ्यात कोणी तरुण पोलीस, "गावभवानी तर आहे..." असे काहीसे पुटपुटला. क्षणार्धात कोर्टात भडका उडाला. इतका वेळ आळसट दृष्टीने पाहणारी ती बाई खाडदिशी जागी झाली. ती ताडताड त्या पोलिसाकडे गेली व त्याच्याकडे हात नाचवून तिने त्याच्यावर शिव्यांचा असा भडिमार केला की, बोलून सोय नाही. ती जे बोलली ते ऐकून बिचारा आमचा प्रोबेशन ऑफिसर शरमेने लाल झाला. आमच्या कानावरच्या शिरा सणसणायला लागल्या. शेवटी मॅजिस्ट्रेटने हुकूम केल्यावर, बॅरिस्टरने मध्यस्थी केल्यावर, ती बाई शांत झाली व जणू काय काही झालेच नाही अशा आविर्भावाने परत विडा चघळीत उभी राहिली. मिनिट दोन मिनिटात हा प्रकार झाला. माझ्या मिशनरी सहचारिणीला काय झाले ते कळले, पण ती बाई काय बोलली ते कळणे शक्यच नव्हते. तिने मला विचारले, "काय हो, काय बोलत होती ती?" "छे! छे! ते भाषांतर करण्यासारखे नाही- आणि मला तरी कुठ सगळे कळले आहे ती काय म्हणाली ते!" मी उडवून लावले. त्या बाईला ठेवायचे कुठे असा प्रश्न पडला- तो काय आश्चर्य! माझी सहकारिणी म्हणाली, "हे पाहा, दोन पोलीस पहाऱ्याला देत असाल तर बाई माझ्या बंगल्यात राहू दे." आम्ही सगळी चकित झालो. पण तिचे मनापासून आभार मानून बाई तिच्या स्वाधीन केली.
{{gap}}दुसऱ्या दिवशी मी आले तो तीही येऊन पोहोचली होती. पुरुष मॅजिस्ट्रेटना यायला अवकाश होता म्हणून आम्ही बोलत बसलो. आज माझ्या सहकारिणीची वृत्ती का कोण जाणे उत्तेजित दिसत होती. डोळ्यात चमक होती, तोंडावर किंचित हसू, किंचित धास्ती, किंचित समाधान असा काही चमत्कारिक मिश्र भाव दिसत होता. तिने आपली खुर्ची माझ्याजवळ ओढली व मला म्हटले, "काय विलक्षण अनुभव! कालची रात्री मी कधी विसरणार नाही!" "म्हणजे? काय झाले?" मी चकित होऊन उदगारले. "अहो, मी रात्रभर त्या वेश्येला माझ्याच खोलीत ठेवली होती..." माझ्या चेहऱ्यावरचे आश्चर्य पाहून ती घाईघाईने पुढे म्हणाली, "मीच पोलिसाकडून दुसरी खाट आणवली व ही व्यवस्था केली, म्हणजे तिने पोलिसांशी संगनमत करून पळून जायला नको म्हणून." "मग तिने तुम्हाला शिव्याबिव्या देऊन मारण्याचा प्रयत्न केला की काय?" मी काळजीच्या स्वरात विचारले. "छे! ती जेवून डाराडूर निजली ती सकाळी आठ वाजेपर्यंत. हालवून हालवून जागे<noinclude></noinclude> o9f4uwzq4lufl4i0ue3xwi4mpt4hjbi पान:Paripurti.pdf/113 104 20935 230174 71719 2026-05-19T08:21:21Z कल्पनाशक्ती 3813 repeat page /* मजकुराविना */ 230174 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm पान:Paripurti.pdf/114 104 20936 230175 71727 2026-05-19T08:25:10Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230175 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १२७ }}</noinclude>करावे लागले तिला." ती थांबली- मी काहीच बोलले नाही, पण माझ्या प्रश्नार्थक मुद्रेला तिने उत्तर दिले, "एक सबंध रात्र अशा बाईच्या सहवासात काढणे, म्हणजे विचित्र नाही का? रात्रभर मला झोप आली नाही. कोर्टापुढे तिच्याबद्दल आलेल्या माहितीचा मी विचार करीत होते-" तिने एक दीर्घ श्वास घेतला व मला विचारले, "ह्या खटल्यासाठी आपल्याला तिच्या घरी जाऊन जागा पाहावी लागेल का?" "काही कारण दिसत नाही." मी शक्य तितक्या निर्विकारपणे उत्तर दिले. माझ्या उत्तराने तिच्या चेहऱ्यावर निराशेची एक सूक्ष्म छटा चमकून गेली. सुदैवाने ती बोलली नाही. ती स्वतःच्याच विचारात गुरफटून गेल्यासारखी दिसली. नेहमी तिच्या चेहऱ्यावर स्वतःबद्दल एक प्रकारचा आत्मविश्वास दिसे. चुकलेल्या जगाला सन्मार्ग दाखविण्यासाठी आपला जन्म आहे अशी तिची ठाम समजूत होती. तिने आपले आयुष्य ख्रिस्ताला वाहिले होते व सेंट पीटरच्या वहीत पुण्याच्या सदरात आपल्या नावाने सारख्या रकमा जमा होत आहेत त्याबद्दल तिला शंका नव्हती. तिला संसार नव्हता. मग संसारातली सुख-दुःखे ती काय अनुभवणार? पण त्यांच्यात तिला अवीट गोडी वाटत होती. ती इतरांच्या संसारांच्या बारीक-सारीक बाबी अगदी अधाशीपणे ऐकायची.... अर्थात, ते केवळ त्यांना सन्मार्ग दाखविण्यासाठीच असे. ती मला दरवेळी बजावायची. आज मात्र तिच्या चेहऱ्यावर केवळ आत्मतुष्टी नव्हती. अमके पुस्तक वाचू नकोस असे सांगितले असताना ते पुस्तक अचानक हाती पडावे, घाईघाईने ते वाचावे, कधी कल्पना नव्हती असे त्यातले काही तरी अर्धवट आपल्याला कळावे- म्हणजे आपली जी मनोवृत्ती होते तशी तिची झाली होती. थोडी शरम, थोडी भिती, अज्ञात प्रदेशात पाऊल घातल्याचा अभिमान असे तर तिला वाटत नसावे? काल रात्री तिला तिच्या उपाशी कौमारहृदयाने त्या वेश्येच्या संगतीत कसली बरे चित्रे रंगविली असतील? माझ्या शब्दांत सांगण्यापेक्षा एक जुनी गोष्टच सांगितलेली बरी.
{{gap}}ही गोष्ट द्रौपदीच्या जन्माबद्दलची आहे. ती मध्ययुगीन जैन वाङ्मयात आढळते, विलायती फ्रॉईडच्या पूर्वजन्मींच्या भारतीय अवताराने सांगितलेली ती कथा अशी: एका नगरात एका श्रीमान सावकाराला पूईगंधा (कोणी तिचे नाव सुकुमालिया असेही सांगतात.) नावाची अतिरूपवती मुलगी होती. तिच्या रूपाला भाळून पुष्कळांनी तिला मागणी घातली. योग्य वेळी त्या सावकाराने मोठ्या थाटाने व पुष्कळ पैसा खर्चुन मुलीचे लग्न त्याच<noinclude></noinclude> 7zjraeltyk7y91q2kwvml10q2fdlhhq पान:Paripurti.pdf/115 104 20937 230176 71730 2026-05-19T08:28:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230176 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१२८ / परिपूर्ती}}</noinclude>गावच्या दुसऱ्या एका सावकाराच्या मुलाशी केले. तो श्रेष्ठिपुत्र रात्री शय्यागारातून धावत बाहेर आला व त्याने आपल्या बापाला सांगितले की, "बाबा, ह्या मुलीबरोबर मी राहणे शक्य नाही. हिला हाकलून द्या." ती अभागिनी बिचारी रडत-रडत लग्नाच्या रात्रीच बापाच्या घरी परत आली. बापाने काही दिवसांनी परगावी जाऊन तेथे तिचे लग्न करून दिले, पण परत तोच प्रकार झाला. असे दोन-चारदा झाल्यावर बापही तिच्यावर रागावला व त्याने तिला घराबाहेर काढून लावले. तिच्या रूपाला भाळून पुष्कळ तरुणांनी तिला आसरा दिला. पण पूर्ववत तिला बाहेर पडावे लागले. शेवटी तिने एका जैन साधूचा उपदेश घेतला व ती श्राविका होऊन गावोगाव भिक्षा मागत व जिनाचे चिंतन करीत हिंडू लागली. सरतेशेवटी ती एका गावी आली. तेथे तिने आपल्या कष्टप्रद निष्फळ जीवनाचा त्याग करण्याचा निश्चय केला व जैन संप्रदायाप्रमाणे उपास करण्यास सुरुवात केली. ती अत्यंत क्षीण झाली. त्या गावच्या उद्यानात एका मोठ्या झाडाखाली बसून ती आयुष्याचे क्षण मोजीत होती. इतक्यात शेजारीच तिला मोठ्याने हसणे व बोलणे ऐकू आले. तिच्या क्षीण डोळ्यांना दिसले की, त्या गावची सुप्रसिद्ध रूपवती वेश्या उद्यानात विहार करीत आहे व त्या गावाचे पाच सुस्वरूप तरुण तिच्या प्रसादाचा याचना करीत तिच्याभोवती भुंग्यासारखे घोटाळत आहेत. अभागिनीच्या मनात आले, 'हाय दैवा! तिला एका वेळी पाच मिळावे आणि माझ्या वाट्याला जन्मात एकसुद्धा येऊ नये?' हा विचार तिच्या मनात येतो तोच तिचा प्राण गेला. मात्र मनाच्या सकाम अवस्थेत देहावसान झाल्यामुळे तिला मुक्ती न मिळता तिला पुनर्जन्म मिळाला व ती दोवई म्हणून जन्माला येऊन तिला पाच पती मिळाले.
{{gap}}आमच्यापुढची ती केस थोडा वेळ चालून थांबली व नव्या केसला सुरुवात झाली. ती होती एका लहान मुलीचीच. तिला बाप व एक लग्न झालेली बहीण होती. सर्व माणसे होती ख्रिस्ती. बापाने त्या लहान पोरीचे लग्न करण्याचा घाट घातला होता. पण ख्रिस्ती बहिणीने तिला पळवून नेऊन आमच्यापुढे आणले होते- बाप पोरगी परत मागत होता. मुलगी फार लहान आहे, एवढ्यात लग्न होऊ नये, असे बहिणीचे म्हणणे होते. ती लहान मुलगी आपली हकीकत सांगत होती. सांगता सांगता ती माझ्या सहकारिणाकडे वळून म्हणाली, "हे बघा, आई, मला माझ्या बहिणीनं संग आणल." माझ्या सहकारिणीला वात्सल्याचे भरते आले. ती आपल्या मिशनरी<noinclude></noinclude> 2ksmrrjmms7vhrmavz039sv9w6rmufr पान:Paripurti.pdf/116 104 20938 230177 71734 2026-05-19T08:30:40Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230177 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १२९ }}</noinclude>मराठीत म्हणाली, "माझ्या लेकरा, सर्व खरं सांग." "बरं का आई, मी तिला इचारलं कशापायी मला नेतीस?"... आमचा प्रोबेशन ऑफिसर मध्येच म्हणाला, "अग, 'आई'- काय चालवलं आहेस? 'बाई' म्हण." माझी सहकारिणी गदगद स्वराने म्हणाली, "छेः! छेः! प्रभूनंच त्या मुलीच्या जिभेला तसं बोलावयास लावलं... प्रभूनंच ही लेकरं मला दिली आहेत." आता वत्सलरसाच्या पाटात सगळे कोर्ट बुडून जाईल ह्या भीतीने मी त्या मुलीच्या बापाला पुढे बोलावले व त्याने सुरुवात केली- "कसं दोन्ही कार्ट्यांनी संगनमत केलं, बाई...." केस पुढे चालू झाली. मी माझ्या सहकारिणीला अगदी जैन धर्मीयांप्रमाणे निदान (मरणापूर्वीची तीव्र इच्छा) केले.... "बाई ग, पुढच्या जन्मी पाच पांडवांची राणी नि शंभर कौरवांची आई हो!"
{{right|{{xx-larger|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude> 95sxrua6v201jnxodgoecypmo2ypl6r पान:Paripurti.pdf/117 104 20939 230178 71740 2026-05-19T08:37:05Z कल्पनाशक्ती 3813 230178 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="जाधव प्रियांका" /></noinclude> {{larger|'''१७'''}}
{{larger|'''वाटचाल'''}} {{block right| {{gap}}काही लोकांनी आम्हाला आतून ढकलले
व काहींनी बाहेरून खाली खेचले व आमचे पाय
जेमतेम धरणीला टेकले. सामान बरोबर आहे ना
हे पाहून कसेबसे आम्ही स्टेशनबाहेर पडलो तो
तेथेही गर्दीच. जमिनीवर बाजार पसरला होता व
मध्ये ठेवलेल्या हातभर वाटेतून माणसे सामान
पाठीवर किंवा डोक्यावर घेऊन चालली होती.
पंचवीस-तीस पावले चालल्यावर आम्ही एका
उघड्या मैदानाशी पोहोचलो. "तो पाहा देवाचा
तंबू. दर्शनाची नुसती गर्दी उसळली आहे."
माझ्याबरोबरच्या गृहस्थांनी दाखवले. मैदानात
माणसांची दाटी झाली होती व त्यांच्या
डोक्यावरून एक एकखांबी मळकट तंबू दिसत
होता. त्यातच पालखी एका दिवसासाठी
विसावली होती. रस्त्यावरची, मैदानातली व
आगगाडीतली सर्व गर्दी ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर
डोके ठेवण्यासाठी उसळली होती. आम्ही तिकडे
न वळता आमच्या बिऱ्हाडाकडे गेलो. एक
मध्यम वयाचे गृहस्थ आम्हाला सामोरे आले.
त्यांनी माझ्याबरोबरच्या गृहस्थांना बसवून घेतले
व एका लहानशा भिंतीपलीकडे बायका बसल्या
होत्या तिकडे मला नेले. बिऱ्हाड म्हणजे एका}}<noinclude></noinclude> p2xjm39wgc3a6slakhpb7mmn9dd0bdd पान:Paripurti.pdf/118 104 20940 230179 71744 2026-05-19T08:40:33Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230179 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१३२ / परिपूर्ती}}</noinclude>नगराच्या घराची पडवी होती. पडवीपुढच्या बाजूला अंगणात सोवळ्याने स्वयंपाक चालला होता. मध्ये एक तीन फूट उंचीची भिंत होती. त्याच्यापलीकडे जरा मोठी पडवी होती. तेथे मराठे मंडळींचा स्वयंपाक त्यांच्यातल्या बायका करीत होत्या. मला दाखवल्या जागी मी गुपचूप जाऊन बसले. इतक्यात कोणीसे म्हणाले, "वाजले किती?" प्रश्न ऐकून मी चपापलेच. वारीला जाताना घड्याळाची उपाधी नको म्हणून ते मी घरी ठेवले होते. पण तेथील एका बाईजवळ घड्याळ होते, त्यांनी सांगितले, "साडेअकरा." "मग आटपा लवकर. पालखी निघण्याच्या आत जेवण आटोपून, भांडी घासून, मोटार पुढे गेली पाहिजे." सोवळ्यातून उत्तर आले, "सर्व तयारी आहे, फक्त जेवणारांचीच खोटी आहे." एवढ्यात जेवणारे पुरुष- आमच्यातले तीन ब्राह्मण गृहस्थ- सोवळे नेसून जेवावयास आले व भिंतीपलीकडे मराठे मंडळीही जेवावयास बसली. आमचे दिंडीवाले जेवून गेल्यावर सोवळ्यातल्या बायकांनी वाढून घेतले व स्वयंपाक ओवळ्यात घेऊन आम्ही इतरजणी बसलो. जेवणे झाल्यावर ओढ्यावरून भांडी घासून आणली. ती पोत्यातून बांधली व पोती मोटारीत टाकली. मराठे मंडळींचेही आटपले होते. त्यांचेही सामान मोटारीत गेले होते. मोटार पुढे गेली. आम्ही विहिरीवरून पिण्याचे पाणी भरून आणले व पालखी निघण्यास वेळ होता म्हणून बायका जरा लवंडल्या. मी काही चालून थकलेली नव्हते, मी भिंतीला टेकून बसले व माझी पुढील काही दिवसांची सोबत कोण कोण आहे ते पाहू लागले.
{{gap}}आम्ही एकंदर नऊ-दहाजणी होतो. पैकी तीन वयस्क सोवळ्या बायका, इतर सहा-सातजणी मध्यम वयाच्या व एक- ताई... अगदीच पोर होती. पुढल्या मुक्कामाला आणखी दोन-तीनजणी येऊन मिळाल्या. भिंतीपलीकडे पुरुषांच्या बैठकीत एक गृहस्थ होते. त्यांना आम्हा काका म्हणत असू. हे भजनी दिंडीत होते. ते हिशेब बघत. काय वस्तू आहे-नाही बघत, पण वास्तविक बाजारहाट स्वयंपाकपाणी बायकाच करीत. काकांची मदत असे इतकेच. आणखी एक गृहस्थ होते. ते प्रसिद्ध प्रवचनकार असून दिंडीतील सर्व मंडळींना गुरुस्थानी होते. ते फक्त जेवणास व संध्याकाळच्या फराळापुरते यावयाचे. त्यांचे बसणे-उठणे इतर भजनी मंडळीत असे. त्यांच्याच कृपेने मी आज ह्या समुदायात आले होते. ताई माझ्याजवळ बसून मला बायांची नावे त्या कोठल्या गावच्या; वगैरे सांगत होती. पलीकडे<noinclude></noinclude> p7nv67dpp1iexyc0wjdj0n7vjijvdcq पान:Paripurti.pdf/119 104 20941 230180 71752 2026-05-19T08:46:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230180 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १३३ }}</noinclude>दिंडीचे व्यवस्थापक व भजनी मंडळी गुरुजींशी संभाषण करीत होती. त्यांचे शब्द कानांवर पडत होते. शेजारच्या थोरल्या पडवीत दिंडीच्या मालकीणबाई मराठे बाया मंडळींकडे जरा लवंडल्या होत्या. त्या व त्यांची बहीण आळंदीहून दिंडी काढीत व भजनी मंडळीच्या जेवण्या-राहण्याची सर्व व्यवस्था करीत असे कळले. आज ताईने मला त्या फक्त दाखवल्या, मग पुढे त्यांची-माझी चांगली ओळख झाली. थोड्या वेळाने दिंडीवाले उठून गेले व आता लवकरच पालखी येणार म्हणून बायकाही उठून तयारीला लागल्या. इतक्यात तुतारी ऐकू आली, पाठोपाठच भजनाचा गजरही कानी आला व आम्ही बिऱ्हाड सोडून सडकेच्या कडेला जाऊन उभ्या राहिलो. निरनिराळ्या दिंड्या भजन करीत चालल्या होत्या. आमची दिंडी आली व संतांची पायधूळ मस्तकी घेऊन इतर बायांप्रमाणेच मी पण दिंडीत शिरले, भजन चालू होते, "ऐसी कळवळ्याची जाति करि लाभावीण प्रीती..." सांगणे सोपे, पण होणे शक्य आहे का? का नाही? सगळ्या आयांची प्रीती अशीच नसते का? मुलांकडून काही मिळेल म्हणून असते ती? परवा जाऊबाईंच्या अंगणात मांजराने पिल्लू मारले म्हणून ती चिमणी तडफडत होती- सारखा आक्रोश करीत होती. तिची प्रीती काय लाभावर आधारलेली होती? प्रीती काय विचार करून आणता येण्यासारखी चीज आहे? ती जन्माला येते ती काय आम्हाला विचारून, परवानगी घेऊन येते? ती न विचारता हृदयाच्या धाग्या-दोऱ्यात स्वतःला विणून घेते आणि मनुष्य आयुष्याचा मार्ग आक्रमीत असता ह्या धाग्याची ओढाताण होत असते- कित्येक अजिबात तुटून जातात व माणसे रक्तबंबाळ हृदयाने शेवटी म्हणतात, "सोडव, देवा, आता." आयांचीच का? सगळीच प्रीती लाभावीण असते, म्हणूनच तर त्यातून दुःख निर्माण होते.
{{gap}}इतक्यात माझ्या शेजारच्या बाईने मला हालवले. "ही पाहा बाई पंचारती घेऊन उभी आहे. जागजागी उभ्या आहेत बाया पालखीला ओवाळायला." माझी तंद्री भंगली. मी पाहू लागले. सबंध रस्ता माणसांनी फुलून गेला होता. दोन्ही बाजूंनी ज्ञानबा-तुकारामाच्या नावांचा घोष चालला होता. दिंडीतल्या लोकांच्या भजनाने, टाळ-मृदंगाने जग नादमय झाले होते. आम्ही गाव ओलांडून रस्त्याला लागलो. चालण्याचा वेग जरा जास्त झाला. सूर्य अभ्राच्छादित होता. वारा धों-धों वाहत होता व उडणाऱ्या धुळीमुळे वातावरण धुंद झाले होते. आळंदी, पुणे, सासवड, वगैरे डोंगराळ मुलूख<noinclude></noinclude> 05stqlarudae1wm231ywkfvhim3m019 पान:Paripurti.pdf/120 104 20942 230181 71760 2026-05-19T08:51:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230181 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|१३४ / परिपूर्ती}}</noinclude>मागे टाकून पूर्व महाराष्ट्राच्या पठाराची चिन्हे दिसू लागली होती. तरी मधूनमधून टेकड्या व जरा मागे मोठाले डोंगर दिसत होते. यंदा इकडील भागात रोहिणीचा पाऊस खूप पडला होता, म्हणून मधेच किंचित ओलावा होता व वातावरण प्रसन्न होते. निरनिराळ्या अभंगांचे शब्द अधूनमधून कानांवर पडत होते. "वेगे आणावा तो हरि..." "लावोनिया हात कुरवाळिला माथा..." "ये ग, ये ग विठाबाई..." एवढ्यात सर्व दिंड्या थांबल्या. का बरे? शेजारची बाई म्हणाली, "उभं रंगण आहे म्हणून." तिच्या शब्दाचा अर्थ मला कळला नाही. पण बाकीचे काय करतात ते आपण करावे म्हणून मी उभी राहिले. पालखीपुढे चालणारा सर्व समाज दुभागून रस्त्याने दुतर्फा उभा राहिला. मध्ये दहा फूट जागा ठेविली होती. "जय जय विठोबा रखुमाई" तालावर सुरू झाले. टाळ जोराने वाजू लागले. मृदुंग पहिल्याने धीमे धीमे व मग भराभर नाद देऊ लागला. म्हणणारे लोक तालावर जागच्या जागी पावले टाकू लागले, म्हणण्याची लय हळूहळू वाढू लागली- दुगण झाली चौगण आता वाढणार तरी किती? नाचणाऱ्या लोकांमागे बघणारा स्त्रीसमाज होता. त्यांचीही अंगे आपसूक तालात हलू लागली. इतक्यात तांबूस रंगाच्या घोड्यावर बसलेला व रुप्याच्या काठीत बसवलेले निशाण घेतलेला एक स्वार व त्याच्यामागून मोकळा घोडा हातात धरलेला एक इसम असे दौडत पालखीपर्यंत गेले. घोड्यांनी पालखीशी डाके ठेवले, व स्वार व रिकामा घोडा आले तसे दौडत परत गेले. "पाहिलत मुक्या जनावरालासुद्धा किती भक्तिभाव असतो तो?" माझ्या शेजारच्या बाई म्हणाल्या. "पण हे घोडे कसले पालखीबरोबर?" मी विचारले. माझ्या अज्ञानाची कीव करीत त्यांनी सांगितले, "तो रिकामा पांढरा घोडा आहे ना... पुढे चालतो तो? तो देवाचा. त्यावर रेशमाचं खोगीर आहे व मागून निशाण घेऊन बसलेला स्वार येतो तो देवाचा स्वार. हे दोन्ही घोडे सरदार शितोळ्यांनी देवाला (ज्ञानेश्वरांना) दिलेल्या सरंजामापैकी आहेत," मी "ठीक" म्हटले. एवढ्यात रंगण आटोपून पालखी परत मार्गी लागली.
{{gap}}रात्रीचा मुक्काम लवकरच आला. एका वाड्याच्या ओसरीवर व अंगणात आम्हाला जागा मिळाली होती. शेजारच्या मोठ्या वाड्याच्या सोप्यात बाकीची मंडळी होती. सकाळच्या बांधून आणलेल्या भाकऱ्या पोळ्या व चटणीवर संध्याकाळचा फराळ आटोपला व आम्ही बिछाने पसरले. पुरुष मंडळींना काहीतरी फराळाचे केले होते. पण ती येण्याचे आतच<noinclude></noinclude> lmep4ob3kx4zvayhg7c3u8b11hitx0b पान:Paripurti.pdf/121 104 20943 230182 71765 2026-05-19T08:54:29Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230182 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १३५}}</noinclude>मला झोप लागली. फराळ केला म्हणजे मी व आमच्या दिंडीतल्या एका मुलीने. बाकीच्या बायका मागून बसणार होत्या. पंढरपूरपर्यंत हाच कार्यक्रम असे. ताईला भूक लागायची. ती संध्याकाळचे लवकर खायची, मी पण तिच्याबरोबर माझे उरकीत असे. बाकीच्या बायांचे मागून व्हायचे. काहींचा उपवासाचा फराळ, काहींचा खरकटा फराळ, काहींचे नुसते दाणे व साबुदाणे असे पाच बायका व पंचवीस प्रकार असतात. सकाळच्या जेवणाची हीच रीत. काहींचा साधा सोमवार, काहींचा आळणी सोमवार, काहींचा कडकडीत सोमवार, काही दुपारी जेवणाऱ्या तर काहींचा सोमवार संध्याकाळी सुटणारा, आणि ह्याशिवाय पुरुष असत त्यांच्यासाठी संध्याकाळी निराळे फराळाचे व्हावयाचे. ही सर्व भानगड व त्यापासून उत्पन्न होणारे चौपट काम दिवसभर चालून त्या बायका कशा करीत ते त्यांच्या त्याच जाणत. पंढरपूर जवळ येत चालले तसतसे रोजच्या उन्हाने सर्वांची तोंडे काळवंडून सुकली, रोजच्या श्रमाने ग्लानी आली. बहुतेक सर्वांचेच पाय दुखत होते; पण रोजच्या कामाची कोणी फारशी कुरकूर केली नाही. त्यातल्या त्यात म्हाताऱ्या होत्या त्यांची जपणूक विशेष करीत. कोणी आजारी पडले तर औषध देत. त्यांचे कष्ट व आनंदी स्वभाव पाहून मला भारी आश्चर्य वाटे.
{{gap}}पहाटे साडेचार वाजता उठलो. अंधारात कंदिलाच्या उजेडात सर्व प्रातःकृत्ये आटोपली. एकीने आडाचे पाणी काढावे, एकीने अंग धुवावे, एकीने लुगडे धुवावे असे पाळीपाळीने, घाईघाईने स्नान केले, आडाला हातरहाट होता एक व आंघोळी करणारे बायका-पुरुष होते शंभर! खूपच धांदल आणि गर्दी झाली. मी मारे कपडे धुण्याच्या व अंगाला लावायच्या साबणाच्या वड्या आणल्या होत्या! त्या परत नेऊन ठेवल्या त्या पुण्याला परत आल्यावर काढल्या. अंधारात वेणीफणी करणे व कुंकू लावणे माझ्या अगदी लहानपणापासून अंगवळणी पडले होते; त्यामुळे गैरसोय वाटली नाही. माझे सर्वांच्या आधी आटोपले व आता आज पादुकांचे दर्शन करावे म्हणून सामान मोटारीत टाकून मी निघाले. पालखी चांगली अर्धा मैल आमच्या उताराच्या पुढे होती. गावकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी दर्शनाला चालल्या होत्या. एका मोठ्या वावरात पालखी उतरली होती. भोवती हजारो माणसांचा मुक्काम होता. बिऱ्हाड गुंडाळण्याची तयारी चालली होती. काही बैलगाड्या व लोक मार्गी लागले होते. इतर भल्या पहाटे न्याहारीचे<noinclude></noinclude> s2x9jk1h5l7zad62r8oxwo8stsfa6mf पान:Paripurti.pdf/122 104 20944 230183 71778 2026-05-19T08:58:51Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230183 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १३६ / परिपूर्ती}}</noinclude>उरकून बांधाबांध करीत होते. ही झाली मध्यम स्थितीतल्या गृहस्थाश्रमी शेतकऱ्यांची यातायात. दिंडीबरोबर अगदी भणंग लोक पण खूप होते. मिळेल तेथे खायचे, जागा सापडेल तेथे पथारी पसरायची, व पालखी चालू लागली की चालायचे असा त्यांचा प्रघात असे. शिवाय, भिकारी नसूनही उघड्यावर मुक्काम करणारे लांब-लांबून आलेले लोक होते. पाऊस पडला तर फार हाल होतात. सर्वांच्या मलमूत्राची घाण सर्वत्र पसरते; पण यंदा पाऊस सुदैवाने फार पडला नाही. रात्रीच्या मुक्कामाला मुळीच पडला नाही, पण मळभ असल्यामुळे उन्हाचा त्रास होत नव्हता म्हणून लोक सुखात होते.
{{gap}}मी मराठीच्या आदिकवींच्या पादुकांवर डोके ठेवून बाहेर पडणार तो एका बाईने मला पूजा पाहण्यासाठी तंबूतच बाजूला नेऊन बसवले. दर्शनोत्सुक भक्तांना बाजूला सारून तंबूची प्रवेशद्वारे बंद केली. चांदीच्या ताटात घालून चांदीच्या पादुका पुजाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. यथासांग पण जरा घाईने प्रवासाला साजेल अशी पूजा होऊन आरती झाली व देवाभोवती मानकरी उभे राहून एक पडदा उभारला गेला. शेजारच्या बाईंना मी विचारले, "हे हो काय?" त्या म्हणाल्या, "देवाला नैवेद्य झाला. देव भोजत करीत आहेत. त्यांना दृष्ट लागू नये म्हणन भोवती पडदा धरला आहे." देवाच्या सगुणत्वाची व साकारत्वाची ही परिसीमा पाहून मी आश्चर्याने स्तंभितच झाले. "पूर्वी खरोखरीच देवाच्या ताटातील लाडू फुटत असे. हल्ली श्रद्धा नाही म्हणून असले साक्षात्कार नाहीत." त्या बाई पुढे म्हणाल्या, मीही मान डोलावून तंबूच्या बाहेर पडले. दर्शनाला येणाऱ्यांची गर्दी परत आत लोटली. "बायांनो, ओवाळणी टाका. ओवाळणी टाका." पालखीजवळचे दलाल ओरडत होते. येणाऱ्यांचे मन देवाच्या पायाशी घोटाळत होते, तर पालखीजवळच्यांचे लोकांच्या खिशावर स्थिरावले होते- ह्या कोंदट वातावरणातून मी झपाट्याने बाहेर पडले तो तुतारी वाजली. साडेसहाला देवांचा मुक्काम न चुकता हालत असे त्याचीच ही सूचना होती. मी वाटेवर चालणाऱ्या बायांत मिसळले व पुढची वाट काटू लागले.
{{gap}}सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत मधले दोन-तीन तास वगळून सर्व वेळ चालण्यात जाई. सर्वांत पुढे सामानाने भरलेल्या बैलगाड्या असत. त्यांच्या नंतर शेकडो माणसे गटागटाने, गप्पा मारीत, अभंग म्हणत, भजन करीत जायची व सर्वांत मागून मुख्य मिरवणूक असायची. पहिली दिंडी अस्पृश्यांची, मग देवाचे घोडे, त्यांच्यामागून शेकडो झेंडेवाले व मागून इतर<noinclude></noinclude> otnzn2ojz4rapnmky5ybvu9dqif64a1 पान:Paripurti.pdf/123 104 20945 230184 71785 2026-05-19T09:08:29Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230184 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १३७ }}</noinclude>दिंड्या आणि नंतर पालखी घातलेली गाडी व मागे मैलभर चालणारी मंडळी. बायका पुरुषांच्या बरोबरीने होत्या. त्यांची लाल, हिरवी, निळी निरनिराळ्या काठांची लुगडी, पुरुषांची मुंडाशी व पगड्या, झेंडेकऱ्यांचे उंच फडफडणारे भगवे झेंडे, दोन्ही बाजूंना मैल न मैल पसरलेली काळीभोर नांगरलेली शेते- लांब क्षितिजावरच्या टेकड्या, रस्त्यावरची हिरवळ आणि वरती पावसाळी ढगांमधून डोकावणारे निळे आकाश हा देखावा किती बघितला तरी माझ्या डोळ्यांची तृप्ती होत नसे. दुपारच्या मुक्कामात ओढ्याकाठी वावरात हजारो मंडळींचा मुक्काम होई. चालणारे रंगीत चित्र काही काळ काळ्या दगडाळ माळावर स्थिर होई. बायका-पुरुषांचा पहिला उद्योग पहाटे आंघोळ करून आणलेली ओली चिरगुटे वाळविणे हा असे. सर्व माळ रंगीबेरंगी पट्ट्यांनी भरून जाई. ठिकठिकाणी पेटलेल्या चुलीतून सदागती निळसर धूर व हलणाऱ्या ज्वाला दुपारच्या उन्हात तरळत वर जाऊन चित्रातील स्थिर पार्श्वभूमीवर उठून दिसत. सकाळपासून संध्याकाळपर्यंत टाळ-मृदुगांचा आवाज व तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव, ह्यांचे अभंग कधी गोड गळ्यांनी म्हटलेले. कधी तर ओरडून तारस्वरात म्हटलेले कानात भिनून जात. रात्रीच्या मुक्कामी बिऱ्हाडात, चार भिंतीत जे भजन होई तेथे आवाजाचा बेसूरपणा व टाळांचा कटू ठणठणाट ऐकून मन खिन्न होई; पण दिवसा मोकळ्या रस्त्यावर टाळांचा आवाज कधीच असहनीय झाला नाही. अभंगाचे शब्द ऐकून त्यांच्या अवीट गोडीत मन इतके रंगून जाई की, आवाजातील गोडीचा तेवढा आस्वाद घेऊन बेसूरपणा विसरण्याची प्रवृत्ती होई. रस्ताभर पहाटेचे काही तास वगळून वारा भिणभिण वाहत असायचा. घरून निघताना हौशीने मला सांगितलेच होते की, "बाई, छत्री नेऊन काही फायदा नाही. वारा इतका बेफाट सुटतो की, ती उघडून धरताच येत नाही." त्याचे पुरे प्रत्यंतर आले. मी म्हटले. "बरे झाले छत्री आगगाडीत विसरले!" वाऱ्याने हालणारे बायकांचे पदर, झाडांच्या फांद्या शेतात कुठे-कुठे पेरलेला निळवा ह्यांनी त्या अखंड चाल चालणाऱ्या माणसाची गती जास्तच भासे, आणि वरती ढगही सारखे वाऱ्याने भिरभिरत असायचे. मी एका रंगमय, दमय, वाऱ्याने भरलेल्या गतिमान अवकाशात सारखी पुढे-पुढे चालत होते. खाली पाहिले की असंख्य पाय चालताना दिसायचे, वरती पाहिले की असंख्य डोकी टाळ-मृदंगांच्या तालात वर-खाली होत पुढे जाताना दिसायची. मला वाटे, ह्या जनप्रवाहातील मी एक बिंदू आहे. मी माझ्या<noinclude></noinclude> qa8nm1pp92i7610e8ykyckv9l2fra71 पान:Paripurti.pdf/124 104 20946 230185 71797 2026-05-19T09:15:48Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230185 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १३८ / परिपूर्ती}}</noinclude>पायाने चाललेली नसून भोवतालची चलसृष्टी मला लांब-लांब नेत आहे. रात्री निजले तरी मी चालतच आहे असा भास मला होई व सकाळी उठल्यावर रात्रीच्याच ठिकाणी मी कशी ह्याचे मला आश्चर्य वाटे.
{{gap}}आज आमच्या दिंडीतल्या मराठे मंडळींचा व ब्राह्मण मंडळींचा मुक्काम दुपारला शेजारी-शेजारीच होता. दिंडी त्यांचीच होती. सामानाची मोटार, लाकूडफाटा वगैरेंची व्यवस्था, त्याचप्रमाणे दुपारच्या मुक्कामाची व रात्रीच्या बिऱ्हाडाची जागा दिंडीचे मराठा मालकच बघून ठेवीत. रोज बरोबर चालायचे, जवळजवळ मुक्काम असायचा; पण जेवण मात्र निरनिराळे, हे मला कससच वाटे; म्हणून मालकांना म्हटले. "बुवा. आज मला तुमच्याकडे जेवण घाला." बुवांनी मोठ्या अगत्याने कबूल केले. मोटार आल्यावर भराभर स्वयंपाक खाली उतरला, चूल पेटवून वरण गरम केले. पत्रावळी मांडल्या व एक पुरुषांची व एक बायकांची अशा पंक्ती मांडल्या. वाढप एक-दोन बाया व दोन-चार पुरुषांनी केले. बायांनी फक्त पहिली वाढ केली, शेवटपर्यंतचे वाढणे पुरुषांनीच केले. सर्व बायकांत हसत खेळत जेवण झाले. रात्रीचे बिऱ्हाड असेल तेथे बायकांनी पहाटे साडेतीन-चार वाजता उठावयाचे व दोन-तीन चुली पेटवून भात, भाजी. पोळ्या असा स्वयंपाक करून भांड्यांची तोंड गच्च बांधून तो स्वयंपाक मोटारीत सर्व सामानामाखाली भरायचा अशी मराठे मंडळींची प्रथा होती. दुपारच्या मुक्कामाला भात चांगला गरम असे व त्यावर गरम केलेले वरण घातले म्हणजे अन्न रुचकर लागे. ह्या प्रथेचा फायदा म्हणजे दुपारच्या मुक्कामाला पोहोचताच जेवणाची पाने पडत, जेवण झाल्यावर दोन तास पालखी हालेपर्यंत विश्रांती मिळे व दुपारची चाल अगदी भरल्या पोटी होत नसे. ब्राह्मणांचा स्वयंपाक मुक्कामावर होई. चूल मांडून, पाणी भरून आणून, भाजी वगैरे चिरून, भात, पोळ्या भाजी, आमटी एवढा स्वयंपाक होण्यास सहज दीड तास तरी लागे. त्यापुढे पुरुष सोवळ्याने बसत. त्यांचे झाले की सोवळ्यातल्या बाया दोन्ही वेळचे वाढून घेऊन बसत. नंतर स्वयंपाक ओवळ्यात घेऊन आम्ही बसत असू. तोंडात घास पडेपर्यंत सपाटून ऊन लागायचे व नंतर जेवण झाल्यावर तहान तहान होत असे. जेवण झाल्यावर घाईघाईने ओढ्यावरून भांडी घासून आणून पोती भरून मोटारीत ठेवायची गर्दी असे. कारण मोटार रात्रीच्या मुक्कामासाठी पुढे जात असे. नंतर जेमतेम अर्धा-पाऊण तास विश्रांती मिळेतो पालखी हालली म्हणजे निघायची वेळ व्हायची. मराठी मंडळींमध्ये<noinclude></noinclude> qabdeovgz6nz1tcbggvnhkzyb90dgy1 पान:Paripurti.pdf/125 104 20947 230186 71812 2026-05-19T09:20:33Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230186 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १३९}}</noinclude>स्वयंपाक बायका करीत, वाढणे, पाणी आणणे, मोठे सामान मोटारीत भरणे, वगैरे कामे पुरुष करीत. एकंदर बायका-पुरुषांचे वागणे जास्त खेळीमेळीचे होते. म्हणजे एकत्र बसणे, हासणे वगैरे नसे, पुरुषांची बैठक व बायकांची बैठक लांब लांब असे, पण वागण्या-बोलण्यात खुलेपणा असे. ब्राह्मण मंडळीत बरेचसे काम बायका करीत. पुरुष दोघेच, त्यातील एक प्रवचनकार, तेव्हा ते असले म्हणजे बायका चूपचाप असत, दुसरे थोडेबहुत काम करीत, पण एकंदर कामाचा बोजा बायकाच उचलीत. तसे मराठ्यांचे काम सुटसुटीत असे; सोवळेओवळे, निरनिराळे उपास, वगैरे नाहीत. एकदम पंक्ती बसायच्या व एकदम उठायच्या. म्हणून पन्नास-साठ मंडळी असूनही भराभर उरकत असे. एका दिंडीत असून जेवण निरनिराळे ह्याचे मला रोज वैषम्य वाटे. ती मंडळी सर्व स्वच्छ, अंग धुतल्याशिवाय न जेवणारी अशीच होती. मग हे अंतर? का एकत्र चालण्याने, देवाचे भजन करण्याने, संताचे काव्य बरोबर म्हणण्याने काय फक्त पारलौकिक कल्याणाचा व्यापार साधायचा होता, आणि ह्या जगातील द्वैत कायम ठेवायचे? असा प्रश्न सारा वेळ माझ्यापुढे असे. बरोबरच्या ब्राह्मण मंडळींनी प्रेमाने मला आपलेसे केले होते. तसेच मराठे बायांनीही केले होते. दोन्हींना एके ठिकाणी आणणे शक्य नव्हते; म्हणून मी आज इकडची तर उद्या तिकडची पाहुणी म्हणून माझ्यापुरते तरी दोन्ही सांधायचा प्रयत्न करीत होते. आणि खरोखरीच एकत्र जेवणाच्या दिवसापासून त्या बाया जास्त आपुलकीने वागतात असे वाटले. रस्त्याने चालताना कित्येकदा माझ्याबरोबर चालू लागल्या. माझा हात हातात धरून माझ्याशी किती मनमोकळ्या गोष्टी बोलत. शेवटी शेवटी काहीजणींनी "बरं का, ताई, आम्ही पुण्याला तमच्याकडे येऊ बरं का!" असेही सांगितले. एक मुलगी म्हणाली, "पण ताई. तेव्हा आता वागता तशा वागाल ना?" प्रश्न साधा, पण मला वर्मी लागला- आज हजारो वर्षे आम्ही शेजारी राहतो, पण अजून त्या आमच्या व आम्ही त्यांचे झालो नाही.
{{gap}}हे असे का होते? ब्राह्मण मंडळी इतकी का दुष्ट आहेत? छे! मुळीच नाहीत. त्या मराठा बायांना कोठे लागले तर पुढे होऊन औषध द्यायची. कोणाला भूक लागली तर खात्रीने पोटभर जेवू घातले असते. पण त्यांच्या हातचे खाणे व त्यांनी आणलेले पाणी पिणे हे मात्र त्यांना वर्ज्य होते. ह्यात काही वावगे करतो असे कोणाच्या मनातही येणे शक्य नव्हते. सर्वजणी एका जुन्या रूढीच्या चक्रात सापडलेल्या होत्या. काही मनापासून रूढी पाळीत<noinclude></noinclude> flv4ffduxyoexbrm0cg8sqw5t3uueoj पान:Paripurti.pdf/126 104 20948 230187 71860 2026-05-19T09:25:15Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230187 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १४० / परिपूर्ती}}</noinclude>होत्या. काही लोकांत बरे दिसणार नाही म्हणून पाळीत होत्या. पण शहरात निरनिराळ्या लोकांशी नित्य संबंध येणारे ख्रिस्ती, मुसलमान वगैरे लोकांच्या समाजात वावरणारे पुरुषही त्या बायांसारखेच वागत. ह्याचे शल्य मला जास्त वाटे. वारकरी संप्रदाय, बाह्योपचार व दांभिक आचारधर्म ह्यांविरुद्ध संतांचा उठाव, अद्वैताची शिकवण व ह्या सर्वांवर कडी करणारे हल्लीचे शहरी जीवन ह्याचा सोवळ्या-ओवळ्याशी मेळ कसा घालायचा? काही प्रसंग तर मला फारच उपमर्दकारक वाटले. कोठचा मुक्काम ते काही आता आठवत नाहा, पण संध्याकाळी बिऱ्हाडी पोहोचतो तो असे आढळून आले की विहीर जवळजवळ फर्लांगभर लांब आहे. विहिरीवर जाऊन, हातपाय धुऊन एक लहानशी कळशी भरून आणली. मोटारीतून वळकटी वगैरे आणली व ओसरीवर बसले होते. एवढ्यात 'सर्व व्यवस्था ठीक झाली ना?" विचारायला बुवा आले. मी म्हटले, "जागा छान आहे, पण पाणी फार दूर हो! पायाचे तर आज अगदी तुकडे पडले... आता पाणी भरायला किती लांब जायचे?" बुवांना कीव आली; त्यांनी एक घागर स्वच्छ घासवून, ताजे पाणी भरून गड्यांकडून आमचे बिऱ्हाडी आणून दिली. मी तोंडाने दुवा देत भरपूर पाणी प्याले, पण माझ्याबरोबरच्या माऊल्यांनी स्वतः आणलेले पाणी पिण्यासाठी व चहासाठी वापरले व बुवांनी आणवलेले पाणी फक्त परसाकडे जाण्यासाठी उपयोगिले! त्याच दिवशी पहाटे आम्ही अंधाराच्याच उठून ओढ्यावर स्नानास गेलो होतो. किती तरी लोक तोंड धुवीत, दात घाशीत खाकरत-खोकरत आमच्याभोवती होते. मी कशीबशी अंघोळ केली. त्या पाण्यात मला तोंड धुऊन चूळही भरवेना! ह्या सर्व बायांनी "गंगे! भागीरथी!" म्हणून तेथे आंघोळ केली... अगदी चुळाही भरून तोंडे धुतली, तेव्हा आपल्या शेजारच्या व इतर जातीच्या माणसांच्या खाकरण्याचा ह्यांना विटाळ झाला नाही आणि आता मात्र ह्या आडाच्या स्वच्छ पाण्याचा ह्यांना विटाळ होत होता!
{{gap}}तीच गोष्ट बोलण्या-चालण्याची. अशाच आम्ही ओढ्यावर अंग धुवत होतो. बरोबर दोन कंदील आणले होते. मी अंग धुवून बाहेर आले तो दुसरा कंदील दिसेना म्हणून इकडेतिकडे चौकशी करू लागले. आमच्यापैकीच काहीजणी मागाहून आल्या होत्या. त्यांनी कंदील परसाकडे जाण्यासाठी नेला होता हे मला व माझ्याबरोबरच्यांना माहीत नव्हते. इतक्यात आमच्यासमोरच एक बाई कंदील हातात घेऊन ओढ्यात शिरली,<noinclude></noinclude> kv6uqkrpz1lzc6wv7jhjnih6g4544uo पान:Paripurti.pdf/127 104 20949 230188 71866 2026-05-19T09:30:01Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230188 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १४१ }}</noinclude>तेव्हा मी म्हटले, "हा तर नाही ना आपला कंदील विचारू का त्यांना?' पण माझ्याबरोबरच्या बाईने ओरडून कंदील नेणाऱ्या बाईला आधीच हटकले, "ए बया, कोणाचा कंदील चालवला आहे?" ती बाई झटदिशी वळून म्हणाली, "कंदील माझा आहे. आणि 'बया, बया' कोणाला ग करतेस?" चूक आमचीच, पण माझ्याबरोबरच्या बाईंना आश्चर्य वाटले. त्या माझ्याकडे वळून म्हणतात, "पाहिलंत ना कसा रागाचा झटका आला तो? 'अग बया' म्हणायचीसुद्धा चोरी झाली बरं का!" आता शब्दाने शब्द वाढू नये म्हणून मी घाईघाईने वर निघाले. पण आपल्या वागण्यातला व बोलण्यातला उद्दामपणा आपणास कसा जाणवत नाही ह्याचे आश्चर्य व उद्वेग मात्र किती वेळ वाटत हाता. पांडुरंगाच्या पायावर डोई ठेवण्यासाठी दिवसेंदिवस कष्टणाऱ्या आम्ही आमच्याबरोबरच्या जिवंत देवांची अशी अवहेलना का करावी?
{{gap}}पण परिस्थितीचे हे माझे विश्लेषण व्यर्थ भावनेच्या आहारी तर जात नाही? ब्राह्मण आणि इतर ही एक सामाजिक परिस्थिती आहे. बहुसंख्य लोक ही परिस्थिती मान्य करतात- त्यात काही वैषम्य मानीत नाहीत- मी मात्र व्यर्थ त्याचा बाऊ करीत आहे असे तर नाही? तसे खास नाही. ब्राह्मण व इतर हा उपमर्दकारक फरक अनेक रूपकांनी, अनेक अभंगांनी वारकरी संप्रदायातील संतांनीच नाही का दाखवला? ब्राह्मणांच्या अन्यायाची दाद त्यानी पांडुरंगाजवळ नाही का मागितली? "चोखा जरी डोंगा भाव नव्हे डोंगा... का भुललासी वरल्या सोंगा?" हा अभंग आमच्या दिंडीतील भजनी मंडळी कालच आळवून म्हणत होती ती काय त्याचा अर्थ न समजून! सामाजिक विषमतेविरुद्ध हे बंड फक्त अभंगात न राहता हळूहळू कृतीत उतरणार हे स्पष्ट दिसत असता आम्ही आंधळेच राहणार का? सोवळे- ओवळे, एकाचे पाणी चालते, एकाचे वर्ज्य, ही वरली सोंगे आम्ही अजून बाळगून राहणार का? आचारशुद्धतेच्या नावाखाली माणुसकी व शेजारधर्म गमावून बसणार का? "भाव नव्हे डोंगा"... त्या भावाचा मधुर आस्वाद घेण्याची लायकी आमच्यात कधीच का नाही येणार?
{{gap}}पण सुदैवाने हे निष्फळ म्हणून कडू विचार डोक्यात फार वेळ राहण्याची परिस्थिती नव्हती. सगळे वातावरण आनंदमय होते- भांडण, शिव्यागाळी होत नव्हते असे नाही, पण इतर प्रसंगांच्या मानाने फारच कमी. कोणी भांडायला लागले तरी "काय पंढरीच्या वाटेवर भांडता हो?" असे इतरांनी म्हणावे व भांडणारांनी शरमून बाजूस व्हावे असाच प्रकार अनेकदा<noinclude></noinclude> 2qfy95ruewgjz995alwmijvdmyacpnb पान:Paripurti.pdf/128 104 20950 230189 71877 2026-05-19T09:33:46Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230189 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १४२ / परिपूर्ती}}</noinclude>मला दिसला. पालखीपुढं अर्धा मैल, मैल जाऊन एखाद्या झाडाखाली बसायचे असा बऱ्याच जणांचा प्रघात होता. झाडाखाली निरनिराळ्या ठिकाणची बायामंडळी जमत, मग एकमेकींना गाणी म्हणायचा आग्रह चाले. गाण्यांच्या कथावस्तूवरून, ते म्हणण्याच्या व बोलण्याच्या लकबीवरून, कोठची बाई कोण्या प्रदेशातील असावी ह्याचा कयास बांधण्याचा माझा प्रयत्न चाले व मागून विचारून माझा तर्क बरोबर आहे असे कळले म्हणजे मी फार खुशीत असे. एकदा अशीच बसले होते, तो "मले, तुले"' शब्द कानावर आले म्हणून झटदिशी उठून त्या माणसांत गेले. "तुम्ही खानदेशच्या का हो?" "नाही, आम्ही घाटावरल्या." "असं होय?" म्हणून मी तेथेच बैठक मारली. माझ्याबरोबर पुण्याकडच्या बाई होत्या त्या म्हणाल्या, "ह्या तर मावळातल्यासारखं बोलत नाहीत, मग घाटावरच्या कुठल्या?" मी म्हटले, "घाटावरल्या म्हणजे औरंगाबादच्या बाजूच्या, नाही तर बुलढाण्याकडच्या." माझे बोलणे ऐकून त्या बाया खुलल्या. त्यांच्या मुलखाची मला माहिती आहे असे वाटून त्या पुढे म्हणाल्या की "आम्ही वेरूळच्या बाजूच्या." मी विचारले, "तुम्ही कोण्या जातीच्या?" "आम्ही वारीक." मी म्हटले, "आम्ही वारीक, वारीक, करू हजामत बारीक." खुदकन हसून बाईंनी मान हालवली व म्हटले. "वा! घरची खूण समजली की!" त्या मेळाव्यात बाया, पुरुष, लहान मुले मिळून जवळजवळ पन्नास माणूस न्हाव्याचे होते व सगळी माणसे गाडीने पुण्यास येऊन आळंदीपासून पालखीबरोबर चालत होती.
{{gap}}अशीच एकदा झाडाखाली बसले होते. दोघी-तिघी बाया मिळून गाणे म्हणत होत्या. "श्रीशैल्या पर्वता जाऊ, चला गडे मळकार्जुन पाहू. हे गाणे पुणे-सातारच्या बाजूला फारसे ऐकायला येत नाही. "का हो, तुम्ही कानडी मुलखातल्या का?" "छे! नाही! आम्ही मोगलाईतल्या, मराठी मुलखातल्या, पण कानडी मुलखाला जवळच." असे त्यांनी सागितले.
{{gap}}काही बाया-पुरुष बीड, बिदर, परभणी, जालना-थेट नांदेडपासून आले होते. "आम्ही गंगथडीचे" म्हणून ते सांगत. एक दिवस सकाळी रस्त्याने जात होतो. आमच्या पुढेच एक बैलगाडी सामानाने भरली होती व सामानाच्या वरच तीन-चार चिल्यापिल्यांना बसवले होते. त्यातला एक मुलगा आकान्त करीत होता. त्याला गाडीत बसावयाचे नव्हते व त्याच्या आईने त्याला तसेच आत कोंबले होते. तो हात-पाय झाडून मोठा गळा<noinclude></noinclude> bjrlbb3myuyqyworegorz6x0v2ndf68 पान:Paripurti.pdf/129 104 20951 230190 71884 2026-05-19T09:38:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230190 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १४३}}</noinclude>काढून मोकळेपणाने रडत होता व त्याची आई हातात एक जोंधळ्याचे ताट घेऊन हसत हसत त्याच्यावर उगारीत होती. एवढ्यात त्या पोराने दोन्ही हातांनी शंखध्वनी करावयास सुरुवात केली व सगळ्या बायांत एकच हशा पिकला. "पहाटंच देवाचं दर्शन केलं, म्या म्हटलं, पोर लई चाललं म्हून गाडीत बसवला तर आता बोंबा मारतंय! थांब, तुजं टाळकंच सडकते..." म्हणून ती गाडीमागे धावली. तिच्या बरोबरच्या बाया पण "व्हंजी नग, नग... करीत तिच्यामागे लागल्या. हे लटांबर पुढे जाते तो मागून एक तरणी पोरगेलेशी बाई एका लहान पोराला बखोटीला धरून लळत लोंबत घेऊन चालली होती. मी विचारले, "का हो बाई, काय झालं पोराला रुसायला?" तशी ती म्हणाली, "अंवो, त्याला मुळीच चालायला नको- सारा वेळ म्हंतो, 'मावशे, वर उचल.' आता सकाळची वेळ, म्हटलं कोसभर चाल; मग घेते. तर रस्त्यात लोळण घेतो म्हणून असा चालवलाय. आत्याबाई म्हणाल्या, "पाहा कशी गंमत आहे; त्या पोराला चालायला हव म्हणून, ते रडतंय अन ह्याला चालायला नको म्हणून हे रडतंय. ह्याला बसव त्या गाडीत अन त्या पोराला म्हणावं "चल बाबा पायी." एवढ्यात एका पुरुषाने येऊन पोराला पाठीशी बांधले व ती बाई आमचेबरोबर चालू लागली. ती मराठ्याची होती: आडनाव पवार; राहणारी जोगाईच्या आंब्याची. ते मूल तिच्या बहिणीचे. बहीण मेली होती आणि ही जशी पंढरपूरला निघाली तशी बहिणीच्या नवऱ्याने गावाबाहेर पोराला आणून हिच्या स्वाधीन केले. अंगावर एक कुडते- पांघरूणसुद्धा नाही आणि ती बिचारी पंधरा दिवस पोराला घेऊन यात्रा करीत होती. ती आमच्यापुढे गेली; पण अधूनमधून आम्हाला भेटायची. एक दिवस दुपारी रस्त्याच्या कडेला पोराला घेऊन दोन-तीन बाया-पुरुषांबरोबर बसली होती. आम्ही पण विश्रांतीसाठी टेकलो. ती आपले दोन्ही दंड चेपीत बसली होती. "आज फार दमला वाटतं!" मी म्हटले. "काय करू हो? सारा दीस पोराला पाठीशी घेऊन चालायचं. जीव नको झालाय." "मोठेपणी पांग फेडील हो मावशीचे." मी आश्वासन दिले. "तो कसला पांग फेडतो? काल फार त्रास दिला म्हणून मी मुक्कामाला गेल्यावर त्याला चांगला सपाटला, तशी मला म्हंतो, "मावशे, मुझं नरडं दाबू का ग?" आमच्या हशात तीही सामील झाली, आणि ते बेरकी पोर पण तोंड फिरवून हसत होते.
{{gap}}अशी रोज महाराष्ट्राची नव्याने ओळख होत होती. पुण्याहून पालखी<noinclude></noinclude> 7bgnrgaw27fwy5tve7j2n4u4oorwalr पान:Paripurti.pdf/130 104 20952 230191 73057 2026-05-19T09:42:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230191 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १४४ / परिपूर्ती}}</noinclude>निघाली तेव्हा पुणे, जुन्नर, मोगलाई, सातारा, वगैरेकडचे लोक होते; दर मुक्कामाला नवे नवे लोक येऊन मिळत होते. खानदेश, सोलापूर, नाशिक, वऱ्हाड- सगळीकडून प्रवाह घेऊन जसजशी पंढरी जवळ येत चालली तसतशी यात्रा वाढत चालली. सगळी माणसे मराठी होती- निरनिराळ्या जातींची होती, पण एकाच वारकरी पंथाचे अभंग म्हणत होती, एकमेकांशी बोलत होती, एकमेकांना मदत करीत होती, एकमेकींना गाणे म्हणून दाखवीत होती. फक्त मंडळी दिसत नव्हती कोकणची. मी चौकशी केली तर मला कळले, आषाढीला यात्रा देशावरची, तर कार्तिकीला पंढरीला सबंध कोकण लोटते; आता त्यांची भाताची वेळ, ते शेत सोडून कसचे येतात? देशावर शेते नांगरून पडली होती, पण पेरे होण्यास अवकाश होता. त्यांची भक्ती पूर्ण होती, आत्मघातकी खासच नव्हती. मी जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रभर फिरले आहे, पण सर्व देशाचे एका वेळी, एका ठायी होणारे दर्शन मला अदभुत वाटले. "ज्या देशातील लोक पंढरीला येतात तो महाराष्ट्र" अशी महाराष्ट्राची एक नवी व्याख्या मला कळून आली.
{{gap}}त्याचप्रमाणे निरक्षर लोकांत सांस्कृतिक परंपरा कशी पसरते व दृढमूल होते ह्याचा एक धडा नऊ-दहा दिवस रोज मला मिळत होता. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, नाथांच्या ओव्या, नामदेवाचे व तुकारामाचे अभंग, जनाई मुक्ताईचे कारुण्यपूर्ण गोड काव्य, अशी मराठ्यांची उत्तमोत्तम काव्ये म्हणत लोक आपली वाणी गोड व शुद्ध करीत होते व मने सुसंस्कृत करीत होते. ते आपला मार्ग हसत-खेळत आक्रमीत होते. लोकांनी यावे म्हणून त्यांचा आग्रह नव्हता. पालखी जाणार म्हणून जाहिराती लागल्या नव्हत्या, त्यांना बाहेरच्या जगाची पर्वा नव्हती. ते आपल्यातच धुंद होते. मस्त होते. ज्याला अंतःकरण असेल, ज्याला सौंदर्यसृष्टी असेल त्याला हा आनंद लुटायची मोकळीक होती. सुसंस्कृत व साक्षरता यातील फरक एके दिवशी मला विशेष जाणवला. आमच्या दुपारच्या मुक्कामी बसलो असता सहज रस्त्याकडे दृष्टी गेली तो एक पाद्याचे जोडपे दिसले. त्यांच्या हातात लहान लहान पुस्तके होती. प्रभू येशूच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ती आली होती. दोन-तीन दिवसांनी कंटाळून ती निघून गेली असावी, कारण ती पुढे दिसली नाहीत. मला त्यांची चीड आली होती, पण आमच्या मंडळींनी सर्व हसून घालवले. ते जोडपे साक्षर खात्रीने होते. पण संस्कृतीचा लवलेशही त्यांच्याजवळ नव्हता. निरनिराळे मानवसमाज आपल्या<noinclude></noinclude> fn48l307xmhhwb4rhyzqr8mbtbaxj8e पान:Paripurti.pdf/131 104 20953 230192 73066 2026-05-19T09:46:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230192 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १४५}}</noinclude>अंतःकरणातील काव्य, मांगल्य, सदभाव निरनिराळ्या तऱ्हेने प्रकट करतात व ह्या बहुरूपात त्याची ओळख करून घेणे- आपले तेच खरे हा आग्रह धरण्याआधी लोकांचे काय हे अगदी मनापासून समजून घेऊन त्यांच्याशी समरस होणे- हेच नव्हे का संस्कृतीचे लक्षण? "ऐशा कळवळ्याची जाति करी लाभावीण प्रीती"- अंतिम लाभाची आशा न धरता सर्व मानवतेविषयी जिव्हाळा वाटणे हीच नव्हे का संस्कृती? पण एकेश्वरी पंथाच्या- मग तो राजकीय, सामाजिक वा नैतिक असो- अनुयायांना हे पटणार कसे? सबंध दोन-तीन शतके सर्व जगातील लहान-मोठ्या समाजावर स्वामित्व. त्यांची मूल्ये पायदळी तुडविणाऱ्या ख्रिस्त सेवकांना तर हे पटण्याचा सुतराम संभव नाही.
{{gap}}ह्या निरक्षर बायांना किती गाणी, अभंग, भारुडे पाठ होती त्याचा तर मला पत्ताच लागला नाही. सबंध प्रवासात तेच गाणे काही मी परत ऐकले नाही. गाणी उतरवून घेण्याचा सारखा मोह होत होता. पण कागद, पेन्सिल वा पुस्तक ह्यांना हातात धरायचे नाही असा निश्चय करून निघाले होते ना! तशी बायकी गाणी काही सोडली तर सर्व गाणी वारकरी पंथाचीच होती. त्यांचे प्रकार तरी किती? गोंधळ, खेळिये, गौळणी सगळे काही त्यात होते. एक बाई मला म्हणाल्या, "अहो, ही युनिव्हर्सिटी आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना तरी हे शिक्षण व ही शिस्त आहे का?" त्यांचे बोलणे मला कबूल नव्हते. पण युनिव्हर्सिटी नाही तरी पारंपारिक ज्ञानाची जोपासना, संवर्धन व पुढच्या पिढीत संक्रांती ही शिक्षणाची तीन अंगे प्रकर्षाने त्यात होती, ह्यात संशयच नाही. हे शिक्षणसुद्धा अनेकविध होते. धर्म व तत्त्वज्ञान ह्याखेरीज, गायन, नर्तन व नाट्य ह्या तिन्ही कलांचा समावेश त्यात होता; शिवाय सर्व समाजाचे एकत्र जीवनही त्यात होते. गायन विशेष उच्च दर्जाचे होते असे नाही, पण पारंपरिक भजनी चालीखेरीज मृदंगाच्या तालात किती तरी निरनिराळ्या रागांत अभंग म्हणत असत. भैरवी, काफी, भूप, सारंग, जयजयवंती दुर्गा, मालकंस असे किती राग कानावरून गेले! फलटणहून निघालो. त्या दिवशी पहाटे पाऊस पडत होता. फलटणचे एक गायक आमच्या दिंडीबरोबर मैल-दोन मैल आले होते. सकाळचे अभंग विशेषच गोड असतात व त्यांनी आळवलेले व भजनी मंडळींनी त्यांच्या पाठोपाठ म्हंटलेले सूर व अभंगाचे जयजयवंतीचे शब्द अजून माझ्या कानात घुमत आहेत. वरून येणारा पाऊस, खालचा चिखल, इकडे मुळी लक्षच गेले नाही.<noinclude></noinclude> nhsyrmdbruv080ia759rfky7yqj5oqj पान:Paripurti.pdf/132 104 20954 230193 73098 2026-05-19T09:50:38Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230193 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १४६ / परिपूर्ती}}</noinclude>ते गाणारे निघून गेल्यावर समजले की, इतका वेळ आपण पावसात चाललो होतो म्हणून! पालखीच्या वाटेवर पाच वेळा रंगण व बहधा रोज भारुडे होतात. गोल रंगण पाहण्यासाठी व भारुडे ऐकण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातून विशेष गर्दी लोटते. पालखी ठरलेल्या एका मोठ्या वावराच्या मध्यभागी नेतात. पालखीभोवती रंगण पाहणारे स्त्री-पुरुष हजारोंनी बसतात. त्यांच्यावाटली १०-१५ फूट जागा मोकळी सोडतात व त्याच्याभोवती समस्त भजनी वारकरी मंडळी आपापल्या दिंडीत टाळ वाजवीत "ज्ञानबा तुकाराम" वा "जय जय विठोबा रखुमाई"चा गजर करीत उभी असतात. मोकळ्या वर्तुळातून दोन्ही घोडे तीन किंवा पाच खेपा भरधाव घालून देवाच्या पालखीसमोर येऊन देवापुढे मान वाकवून निघून जातात. मग खेडेगावातील आलेले लोक ज्ञानेश्वरांच्या पादुकांचे दर्शन करतात व दिंडीतील मंडळी मनमुराद खेळ खेळतात. कुणी तालावर भजन करीत नाचतात, कोणी झिम्मा खेळतात, कोणी फुगड्या खेळतात, कोणी खो-खो, बेडूक उडी वगैरे खेळतात. बायका आपापसात फेर धरतात. क्वचित बायका-पुरुष मिळून फुगडी व झिम्मा चालू असतो. पुरुषांच्या खेळात बायकांना फारसा वाव नसतो, कारण त्यांचे खेळ खूप झपाट्यान व आडदांडपणे चाललेले असतात. खो-खोच्या खेळात व पटापट ओणव्या गड्यावरून उड्या मारीत जाताना किती पडतात, पण नांगरलेल्या वावरात विशेष लागत नाही. शेवटी सर्व दिंडीवाले नाचत, फेर धरीत, उड्या मारीत पालखीभोवती प्रदक्षिणा करतात व पालखी हलते. भारूडही मोकळ्या वावरातच होते. भारूड हा एक लोकनाट्याचाच प्रकार आहे. भारूडात वेदान्त, पण तो निरनिराळ्या भूमिकांनी सांगितलेला असतो. भारूड करणारेही बहुधा ठरलेले असतात. "अहो, मी राजाचा जोशी" अशी सुरुवात करून, चाळिशी घालून, दोन फूट परिघाचे पागोटे चढवून, जोशाचे सोंग संपले की तोच माणूस "हमामा पोरा हमामा" म्हणून पागोटे फेकून क्षणात वेश बदलून दुसऱ्या भारूडास सुरुवात करतो. प्रत्यक्ष एकनाथांच्या शब्दाखेरीज इतर शब्द व हावभाव खूपच असतात व पुष्कळदा अश्लीलतेचा कळस होतो. शब्दापेक्षाही हावभाव अतिशय अश्लील असतात. हे नाट्य अर्ध्या तासापेक्षा जास्त चालत नाही. बायका-पुरुष सर्व ऐकतात, पोटभर हसतात, रस्त्याला लागली की सर्व विसरतात. धार्मिक उत्सवात कामुक प्रतीके व लोकनाट्य अतिप्राचीन काळापासून चालत आली आहेत.<noinclude></noinclude> n5jqtylp0nqq9zo0cmf0gpy6dm7znjy पान:Paripurti.pdf/133 104 20955 230194 73094 2026-05-19T09:55:27Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230194 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १४७ }}</noinclude>पूर्वीच्या काळी दिवस न दिवस, महिनेच्या महिने जी सत्रे चालत त्यांतही असे काही निव्वळ गमतीचे, काही शृंगारिक, वगैरे करमणुकीचे प्रकार असत. किंबहुना, सर्व नाट्याचा उगम धार्मिक उत्सवात, जादूटोण्यात आहे असाही काहींचा दावा आहे. हा करमणुकीचा प्रकार अश्लील असावा का? नसला तरी चालेल. मोठमोठे संभावीत व विद्वान कीर्तनकार, प्रवचनकार काही भारुडात काम करीत नाहीत. ते बरेचसे अर्धवट शिक्षित लोकच करतात. लोकांना हसवायला सर्वात सोपे साधन म्हणजे निर्लज्ज हावभाव व द्वर्थी वाक्ये, ही फार सनातन कालापासून चालू आहेत. सबंध पंधरवडा होणाऱ्या अखंड भजनात थोडासा हा प्रकार झाला- व तोही खरोखरच थोडासा झाला- तर हरकत नसावी. सर्वांच्या मनात वसणाऱ्या अश्लीलतेला वा बीभत्सपणाला इतक्या थोड्या सामग्रीवर वाट करून देऊन जर ती इतर वेळी, इतर जीवनात दृढनिद्रा घेईल तर ही दिलेली किंमत थोडीच वाटते.
{{gap}}वैराग्यपर कवितेत बीभत्सपणाला वाव पुष्कळच असतो. वासनामय संसाराचा त्याग करायला सांगताना त्या संसाराचे जितके किळसवाणे वर्णन करता येईल तितके करायचे हा प्रघात फार जुना आहे. वारकरी सांप्रदायही त्याला अपवाद नाही. अशाच कित्येक कवनांपैकी मदालसा या नावाने ओळखले जाणारे एक बरेच लांबलचक काव्य आहे. कोणीएक मदालसा नावाची राजस्री आपल्या पत्रांना पाळण्यातच वैराग्याचा उपदेश करते व ते पुत्र पूर्ण विरागी होतात अशी एक कथा आहे. त्यातले मदालसेने आपल्या मुलाना केलेले उपदेश ह्या काव्यात गोवलेले आहेत. "उपदेशे मदालसा । सोऽहं जो जो रे पुत्रा ॥" हे त्याचे ध्रुपद. हे गाणे मी दोन-चारदा तरी ऐकले. वारकऱ्यांच्या मनात वैराग्यपर भावना त्यामळे कदाचित उसळत असतील, पण माझे मन त्या काव्याला विटले हे बरीक खास. "मनुष्याच्या सुंदर त्वचेच्या आत रक्त, मांस. वगैरे कशी द्रव्ये आहेत, मलमूत्र कसे त्याच्या शरीरात आहेत, त्याच्या नाकात शेंबूड किती आहे- त्याचप्रमाणे व्याधी व जरेने हे सुंदर शरीर कसे कुरूप होऊन जाते म्हणून, हे प्राण्या, ह्या शरीराचे व्याप सोड, ब्रह्मचर्याचा स्वीकार कर व संसारापासून निवृत्त हो." हा उपदेश पुरुषांना केलेला असतो. आणि ते ठीकच आहे. बाया ना रंग, ना रूप अशा मांसाच्या गोळ्याला जन्म देतात. त्या खादाड जिवाची दर तीन-चार तासांनी भूक भागवितात. दर तीन-चार तासांनी त्यांचे मुताचे कपडे बदलतात. त्याचे गुवाने भरलेले ढुंगण व अंग धुऊन काढतात व ह्या सगळ्या खस्ता<noinclude></noinclude> homor1zsqk2kayqmi0ws0wtokbc5707 पान:Paripurti.pdf/134 104 20956 230195 73107 2026-05-19T09:58:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230195 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १४८ / परिपूर्ती}}</noinclude>खाता खाता त्या गोळ्याला हळूहळू रंगरूप येऊ लागले व त्याने हसून पाहिले म्हणजे आपल्याला धन्य धन्य मानतात. अशा ह्या आयांना मानवी शरीर कसले केले आहे त्याची पूर्ण जाणीव असते. त्याचे वर्णन करून का त्यांचे मन संसारातून उडून जाणार आहे? पुरुष ब्रह्मचारी असले तरी एका स्त्रीसंगाखेरीज शरीराचे इतर सर्व व्यवहार अगदी नीट आस्थेने चाललेले असतातच. खाण्यापिण्याची चोख व्यवस्था बायको नसली तरी होत असतेच. अशांची नीट व्यवस्था करण्याचा भार गृहस्थाश्रमी लोकावरच असतो. त्यांची जेवणा-खाण्याची सोय कुणी तरी रक्ताची नाही तर धर्माचा आई-बहीण करीत असते. ब्रह्मचाऱ्याची सेवा करण्यास निष्ठेने व भक्तीने स्त्रियाच पुढे सरसावतात. जिवंतपणी तर त्यांची सेवा होतेच, पण मेल्यावर ही भक्ती स्त्रिया पुढे चालवितात. ह्याचे एक मजेदार उदाहरण वाटेनेच पाहिले. पंढरपूर जसजसे जवळ-जवळ येऊ लागले तसतशा सर्व महाराष्ट्रातून पालख्या येऊन ज्ञानदेवांच्या पालखीला भेटू लागल्या. पंढरपूरच्या अलीकडील मुक्कामाला तर पालख्या व दिंड्या ह्यांचे एक नगरच वसते. तेथे सर्व महाराष्ट्राची हजेरी लागते. देहूहून तुकाराम महाराज, सासवडहून सोपानकाका, खानदेशातून मुक्ताबाई, उमरावतीहन खुद्द रखुमाई अशा कितीतरी पालख्या येतात. पैकी काही वाटेतच भेटतात. त्यापैका यंदा सज्जनगडाहून रामदासांची पालखी आली. तिची गाठ वाटेत पडली; पालखी वाहणारे पुरुष होते, पण जवळपास चालणाऱ्या, चवरी ढाळणाऱ्या बायाच होत्या. 'सावधान' म्हणताक्षणीच जिवंतपणी पळून जाणारे साधु रामदासबुवा मेल्यावर स्त्रियांच्या गराड्यात सापडलेले पाहन मला हसू आले. स्त्रियाच अशा साधु-पुरुषांची सेवा करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येतात. ही भक्ति पुष्कळदा सर्वस्वी निष्काम अशी असते. जिला ना पोर ना बाळ, जिचा संसार लहानपणीच उधळला गेला अशी कोणी बाई, बुवांना नीट खायला मिळावे; ते अन्न सुग्रास असावे, ते खाणाऱ्याच्या ताटात ऊन-ऊन पडावे म्हणून धडपड करताना पाहिली म्हणजे बुवांच्या वत्सल हृदयाचीच किंमत मला भारी वाटायची. ऐशी कळवळ्याची जाति । करी लाभावीण प्रीती ॥
{{gap}}मदालसा एकदा पूर्ण ऐकल्यावर माझे मन त्यात रमेनासे झाले. हिंदूच्या समाजजीवनात गृहस्थाश्रमाचे महत्त्व कमी होऊन ब्रह्मचर्याचा व संन्यासधर्माचा बडेजाव कसकसा वाढत गेला ह्याबद्दल माझे विचार भरकटत जायचे. निर्गुण-निराकार ब्रह्माचे आकलन होणे कठीण म्हणून देवाला<noinclude></noinclude> q66pfv8eo7eg85txpohlfq819xnniix पान:Paripurti.pdf/135 104 20957 230196 73112 2026-05-19T10:12:51Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230196 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १४९ }}</noinclude>सगुणत्व देणारा, इतकेच काय तर ती सगुण, गोजिरी मूर्तीच श्रेष्ठ असा अट्टाहास बाळगणारा वारकरी पंथ- अनेक स्त्रियांचा उपभोक्ता श्रीकृष्ण त्यांचा देव— 'जर विठोबा-रखुमाई' असा दांपत्यनामाचा घोष- अर्जुनाला प्रवृत्तिपर बनविण्यास कारणीभूत झालेली गीता त्यांचा आधारभूत ग्रंथ, आणि शिकवण काय; तर ब्रह्मचर्याची- निवृत्तिमार्गाची- हा मेळ कसा घालायचा? "प्रजाभिः प्रजायस्व" ("प्रजेच्या रूपाने परत जन्म घे. प्रजेच्या रूपाने अमर हो.") ही वेदाची शिकवण होती. पुत्रकामेष्टी करणारे असंख्य यजमान धुराने कुरु-पांचालांची पवित्र भूमी अंधारीत होते. औरस संतती नसली तर निरनिराळे चांगलेवाईट मार्ग पुत्रप्राप्तीसाठी मनूने सांगितले; एवढेच काय तर "उपनयनविधीपासून बारा वर्षे ब्रह्मचर्याने राहून गुरुगृही विद्या शिकावी. एखाद्या शाखेत विशेष पारंगत व्हायचे असेल तर आणखी काही वर्षे व्रतस्थ राहून वेदाभ्यास करावा. पण ह्यापुढे ब्रह्मचर्याचा उपदेश करणारे लोक नपुंसकच असावे." असे अगदी स्पष्ट मत शबरस्वामींनी दिले आहे. पण गृहस्थाश्रमाची थोरवी वर्णन केली जात असता एकीकडे अरण्यवास व उपनिषदातील तत्त्वज्ञान परिणत होत होते. बुद्ध व जैन संप्रदाय ह्या तत्त्वज्ञानाच्या आधारे कर्ममार्गाचा हीनपणा दाखवून संन्यासमार्गाचा प्रसार करीत होते. पण संन्यास मार्गाची भरभराट एका सामाजिक विरोधावर अवलंबून असते. भिक्षावृत्तीने संन्यस्त अवस्थेत राहणाऱ्या सांप्रदायिक स्त्री- पुरुषांची (मग ते जोगी, संन्यासी, भिक्षू, श्रमण, कोणीही असोत) उपजीविका संपन्न राजकुळे किंवा वैशाली, श्रावस्ती व चम्पा अशा समृद्ध शहरात राहणाऱ्या श्रीमान व्यापाऱ्यांकडूनच होते! समृद्ध व सुखी गृहस्थाश्रमावरच संन्यासधर्माची उभारणी शक्य होते! हिंदूंच्या सामाजिक जीवनात ही जी मूल्यविषयक क्रांती झाली त्याचा इतिहास जितका महत्त्वाचा तितकाच मनोरंजक आहे; पण मदालसेसारखी गाणी मनोरंजकही नाहीत आणि उदात्तही नाहीत.
{{gap}}मदालसा संपून काही वेळ लोटला होता. एकंदर वातावरणात मला फरक वाटला. क्षणभरात ठेक्यावर नाचत, खुल्या गळ्याने म्हटलेले शब्द ऐकू आले, "बोल रे काऊ, तुझे सोन्याने मढवीन पाऊ" कारण काय तर "पाहुणा पंढरीराऊ" आणीत आहेस. ज्ञानेश्वरांची ओवी चालली होती. मदालसेचे जड वातावरण जाऊन हवा निवळली. मन परत प्रसन्न झाले. आमचे दिंडीतले मुख्य नेहमीच हा विवेक दाखवीत. एकदा मदालसेनंतर<noinclude></noinclude> egxqfe1noqnggunjw95zvp3grosld9c पान:Paripurti.pdf/136 104 20958 230197 73122 2026-05-19T10:19:40Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230197 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १५० / परिपूर्ती}}</noinclude>त्यांनी मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग सुरू केले - "ताटी उघडा ज्ञानेश्वरा" ह्या पालुपदाने अशीच मी माझ्या उदासीनतेतून जागी झाले होते. एकदा संध्याकाळचा टप्पा बराच लांब होता. सूर्य कलला तेव्हा भर उन्हात चालून चालून माणसे थकली होती. हरिपाठ होऊन इतर किरकोळ अभंग झाले होते, पण श्रमाने म्हणा, उन्हाने म्हणा नेहमीचा आनंद वाटत नव्हता, तोच बुवांनी "आम्ही लटके ना बोलू वर्तमान खोटे" सुरू केले. सगळ्यांची तोंडे खुलली आणि लहापणापासून ऐकलेले, असंभाव्य घटनांनी भरलेले ते पद म्हणता म्हणता, हसता हसता वाट कधी सरली ते कळले नाही.
{{gap}}रंगणे चालली म्हणजे सर्कशीचा भास होई. खेळ सुरू झाले म्हणजे उत्साहाने वाटचालीचे दुःख नाहीसे होई. भारूडांचे नाट्य मधून मधून चाले व कधी वैराग्यपर कविता, तर कधी देवाचा धावा, तर कधी "लटके ना बोलू" सारखी नितांत असंभाव्य पदे व अखंड हरिनामाचा गजर ह्यांमुळे सारखी वाटचाल करूनही मन प्रसन्न होते.
{{gap}}म्हणजे काय सर्व वाटसरू आनंदात होते? मुळीच नाही. ही भागीदारी, हे सहजीवन आनंदाचेच नव्हे तर दुःखाचेही होते. किती दुःखीकष्टी माणसे पंढरीच्या वाटेवर चालत होती! ह्या वाटेवर नेहमी हृदयात बाळगलेली दुःखे ती दुसऱ्यांजवळ सांगत होती, भरलेले अंतःकरण हलके करीत होती, आणि वेदना सहन करण्याचे सामर्थ्य आणीत होती. दुःख तरी किती- प्रत्येकाच दुःख निराळे आणि प्रत्येकाचे दुसऱ्यासारखे.
{{gap}}किती सुरेख होती ती बाई! किती गोड बोलणे! एक दिवस आम्ही झाडाखाली सुख-दुःखाच्या गोष्टी बोलत बसलो होतो. बायांच्या गोष्टी काय असणार? तुमचे मालक काय करतात? तुम्हाला मुले किती? असल्याच प्रश्नांची उत्तरे दिल्यावर मी पण तेच प्रश्न विचारले. भरल्या डोळ्यांनी तिने सांगितले, "नाही हो. माझ्या घरी मुलं नाहीत हो खेळत. एवढा मोठा वाडा.. एकीकडे मालक, एकीकडे मी. भांडण नाही, काही नाही; पण बोलणार तरी काय एकमेकांशी? जाते झालं पांडुरंगाच्या पायाशी." मी हळूच विचारले, "देवाच्या पायांशी गाऱ्हाणं घालायला जाता का?" "छेः! छेः! त्याला काय ठाऊक नाही? त्याच्या मनात असेल ते करील. त्यानं ठेवलं तसं राह्यला पाहिजे."
{{gap}}एकदा दुपारच्या जरा विसावलो होतो. शेजारीच दोन-चार बाया- पुरुष व एक तान्हे मूल अशी होती. एका बाईने मुलाला प्यायला घेतले होते आणि<noinclude></noinclude> oogogp81ukr9emzlwjo8bz3tedbmah1 पान:Paripurti.pdf/137 104 20959 230198 73127 2026-05-19T10:24:25Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230198 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १५१ }}</noinclude>सारखी रडत होती. "बाई, काय झालं? काही दुखतं का?" "मले नव्हे हो, पोराले!" ती म्हणाली. ती बाई बीडची. महिनाभर प्रवास चालला होता. दोन दिवस झाले, ते वर्षाचे मूल तापाने फणफणले होते. उन्हापावसात, वाऱ्यात चालायचे- मूल सारखे पाठीशी. त्याला बाधले तर नवल काय? "एवढ्या लहान मुलाला घेऊन कशा निघाला?" "अहो काय सागू? शेजारच्या चार-पाच गावची माणसं निघाली. शेजारणी म्हणाल्या, 'तुझा सारा जीव संसारात. नाही तरी घरी राहून पोरं काय मरायची थांबली आहेत? चल, पांडुरंगाच्या पायाशी चल, चालवतं आहे तोवर.' म्हणून आले. पण आज दोन दिवस पोर डोळा उघडीत नाही हो!" बारीबरोबर सरकारी डॉक्टर व दवाखान्याची मोटार होती ती दाखवून तिला म्हटले, "जा तिकडे, तुला फुकट औषध मिळेल." ती रोज दूध घेऊन मुलाला द्यायची. ते उकळून घे म्हणून काय सांगणार? मी म्हटले, "मुलाला दुधाचा 'चा' ऊन ऊन दे; घाम यऊन ताप जाईल. विठ्ठल तुला नाही अंतर देणार." ती बरोबरच्या माणसांना घेऊन दवाखान्याकडे गेली. पलीकडे एक म्हातारा पागोटे उशाशी घेऊन पडला होता. तो उठून बसला व मला म्हणाला, "ही कसली वारी करते? पोराला ताप आला की, लागली रडायला. देव ठेवील तस राह्यला पाहिजे." मला ह्या शिष्टपणाचा राग आला. मी जरा रागानेच उत्तरले, "तुम्हाला काय जातं बोलायला? ज्याचं दुःख त्याला ठाऊक." म्हातारा म्हणतो, "अहो, तो विठ्ठल मोठा कठीण देव हाये बरं! तुमचं मन दुसरीकडे गुंतलं तर तो सोडवून टाकतो. मीच पाहा ना! बायको होती, मुलं होती, घर होतं. एका साथीत चार दिवसात सगळी खलास. घर टाकलं विकून. पैसे टाकले संपवून. आता म्हणतो, देवा तुझ्याशिवाय कोणी नाही!" त्याच्या हातावर चहासाठी पैसे टाकून दिंडी जवळ आली म्हणून मी उठले. "देवा, तुझ्या मनात मला 'चा' द्यावा असं आलं रे! पांडुरंगा नारायणा!" हे शब्द ऐकू आले.
{{gap}}अशीच एक म्हातारी आजीबाई अधूनमधून दिसायची. एकदा तिला कोणी विचारले, "आजीबाई. तुमची मुलं, नातवंडं काय करतात, कुठ असतात?" म्हातारीने प्रश्न ऐकला मात्र, तिचे डोळे मिटले. तोड भेसूर दिसू लागले व ती आपादमस्तक थरथर कापू लागला. तिचे डोके लटलट हालू लागले व ती शरीर घुसळू लागली. आम्ही घाबरलो व झटदिशी तिच्याजवळ जाऊन तिला बिलगून तिच्या अंगाभोवती हात टाकले. "आजीबाई, सावध<noinclude></noinclude> 5339bp9hnr6ch0h1cyujq8zft5c46rs पान:Paripurti.pdf/138 104 20960 230199 73132 2026-05-19T10:30:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230199 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १५२ / परिपूर्ती}}</noinclude>व्हा, पाणी देऊ का?" अशी विचारणा झाली. माझ्या बाहूंत म्हातारीचा देह थरथरत होता. मला आठवण झाली. माझी एक कुत्री होती, तिचे पिल्लू जनावर चावून मेले. तेव्हा ती थरथरत उभी होती. अशीच तिला जवळ घेतली होती व असाच तिच्या शरीराचा कंप मला जाणवत होता. मनात आले, "आपण माणसं जनावरांच्या किती जवळ!" म्हातारी थोड्या वेळाने कापायची थांबली, वेदनेची जाणीव व आविष्कार पाशवी पायरीवर आला. तिच्या मिटल्या डोळ्यांतून धारा वाहू लागल्या. मुक्या दुःखाला वाचा फुटली. तिने आपली हकीकत सांगितली. दुःख काय? जे इतरांचे तेच तिचे. तिचा एकुलता एक मुलगा भर पंचविशीत गेला होता. ही दुःखे सामाजिक विषमतेमुळे उत्पन्न झाली नव्हती; राजकीय दंगली व युद्ध त्यांच्या बुडाशी नव्हती. ती मानवाबरोबर आलेली व मानवाबरोबर नष्ट होणारी अशी होती, ती रावाला होती, रंकाला होती. तरण्याला होती, वृद्धाला होती. सर्व मनुष्यसमाजाला व्यापून राहिलेली होती. म्हातारी आपली हकीकत सांगून क्षणभर थांबली व एक खोल सुस्कारा टाकून म्हणाली, "पांडुरंगा, तू ठेवशील तसं राह्यचं..." दात-ओठ खाऊन मी पण मनात म्हटले, "तेन त्यक्तेन भुञ्जीथाः।" ह्या लोभी सर्वग्राही मालकाच्या हातून जे सुटेल ते आमचे... "पांडुरंग मोठा कठीण देव आहे बरं! तुमचं मन कुठं गुंतलं तर तो सोडवून टाकतो." पण देवा, ते मन ठायी-ठायी गुंतवतोस का? ते पुरं गुरफटून टाकतोस आणि मग क्रूरपणे ओरबाडून त्याच्या चिंध्या-चिंध्या करतोस ह्यात काय मोठेपणा? ह्या असल्या श्रमलेल्या, फाटलेल्या, रक्ताश्रू गाळणाऱ्या हृदयाला फरफटत तुझ्या पायांशी आणण्यात तुला काय धन्यता वाटते? त्यापेक्षा आयुष्याच्या प्रभातकाळी सुखाच्या कोवळ्या उन्हात फुललेले आमचे जीवनपुष्प तुझ्या पूजेसाठी का खुडून नेत नाहीस?
{{gap}}आता मात्र मला पुरे वेड लागले! त्या म्हातारीच्या तळतळाटाने क्षणभर मला वस्तुस्थितीचा विसर पडला. कोण कोणाला ओढून पायाशी आणणार? सगळा मनुष्याच्या मनाचा खेळ आहे झाले! निराकार, निर्गुण व सर्वस्वी उदासीन तत्त्वातून सगुण परमेश्वर निर्माण करावयाचा, सर्व कर्तृत्व त्याच्या माथी मारायचे, त्याला जगाचा मालक बनवायचे आणि मग म्हणायचे, "तेन त्यक्तेन भुञ्जीथ:"
{{gap}}आम्ही सर्व आपापल्या दुःखदायक विचारात गुरफटलो होतो, इतक्यात एकीने अभंग म्हणावयास सुरुवात केली, "देह जावो अथवा राहो,<noinclude></noinclude> t18n4sgcbnlyu1wfvcr6w6tonaj0yqj पान:Paripurti.pdf/139 104 20961 230200 73139 2026-05-19T10:35:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230200 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १५३ }}</noinclude>पांडुरंगी माझ्या भावो." तिच्या भजनात सगळ्यांनी आपला सूर मिसळला. म्हातारीही बघताबघता आमच्यात सामील झाली. तिच्या कापऱ्या आवाजाने साथ दिली, "आण तुझी पंढरीरावो." थोड्या वेळाने दुःखाच्या सावल्या जाऊन परत प्रसन्नता आली. अशी सर्वांना दुःखे होती, पण सारीजणे एकमेकांच्या साहाय्याने आनंदमय वातावरण कसे निर्माण करीत कोण जाणे!
{{gap}}धर्म ही एक अफू आहे! मानवी संस्कृतीने अशी कित्येक तऱ्हेची अफू व दारू निर्माण केली आहे. अफू खाऊन मनुष्य गुंगून पडतो- दारू पिऊन मस्त होतो. वास्तवता विसरण्याचाच सर्व प्रयत्न. कोणी देव निर्माण करते, कोणी शास्त्र निर्माण करते, तर कोणी राजकीय पंथ निर्माण करतात. शास्त्राच्या अभ्यासात सर्वस्व विसरणारे सहस्रावधी शास्त्रज्ञ अफू प्यायलेलेच नाहीत का? अर्वाचीन शास्त्रामुळे मानवांचे आयुष्य आनंदमय झाले ही घोषणा करणारे ज्ञानमदिरेने धुंद झालेलेच ना? समाजाची पुनर्रचना करून समाजाची दुःखे नाहीशी करणारे महान तत्त्ववेत्ते बुद्धापासून मार्क्सपर्यंत होऊन गेले, पण जुनी दुःखे तर नाहीशी होत नाहीतच, नव्याची मात्र भर पडत जाते व मनुष्य अफूने का दारूने ती विसरून म्हणतो, "आमची प्रगती झाली. आनंदमय संसाराची पहाट उगवली...."
{{gap}}तो वाटचालीचा शेवटचा दिवस. संध्याकाळी इतक्या दिवसांची सोबत सुटणार- जे ते गावात आपापल्या मुक्कामाला जाणार. मला हुरहूर लागली होती.... माझे डोळे परत परत भरून येत होते. हौशी मला म्हणाली हाता, बाई, शेवटच्या माळाला 'रडवा माळ' म्हणतात." "का ग?" त्यावर चालायला लागलं की आपलं रडूच येतं बघा." सगळीकडे निरोप घेणे चालले होते. माझ्या तोंडाने शब्द फुटत नव्हता. मी मानेनेच दिंडीतल्या मंडळीचा निरोप घेऊन पढे निघाले. गावाची शीव आली. मला चुकल्याचुकल्यासारखे वाटत होते. इतके दिवस दिंडीत कधी पुढे, कधी मागे, तर कधी झाडाखाली. तर कधी ओढ्यावर सर्वांबरोबर असणारा तो जवळ दिसेना. मी वळून पाहिले तो तो पाठ फिरवून मागे निघाला होता, मी म्हटले, "काळ्या, बाबा, तू पण सोडून चाललास का रे? पंढरपुरात नाही का येणार?" त्याने हसून मान हलवली. "मग चाललास कुठे?" काही न बोलता त्याने सभोवार हात फिरवला व तो झपाट्याने चालू लागला! खालची नांगरलेली शेते, वर ढगांनी भरलेले आकाश. खांद्यावर घोंगडी<noinclude></noinclude> 8vsioe0phxxjjq76xauvbz774xe10q3 पान:Paripurti.pdf/140 104 20962 230201 73140 2026-05-19T10:36:19Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230201 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १५४ / परिपूर्ती}}</noinclude>घेतलेली ती गोजिरी, सावळी मूर्ती त्यात कधीच दिसेनाशी झाली. मी श्रमल्या पायांनी, भरल्या अंतःकरणाने व वाहत्या डोळ्यांनी पंढरपूरच्या वेशीत पाय टाकला.
{{right|{{xx-larger|☆}}}}{{nop}}<noinclude></noinclude> p9qk8hd1ecs91gf3fkg06bshf4o523r पान:Paripurti.pdf/142 104 20964 230202 73159 2026-05-19T10:40:43Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230202 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader| १५६ / परिपूर्ती}}</noinclude>त्यांचे प्रेमातले भाषण म्हणजे असेच. मुलींना ते 'म्हैस' म्हणत व मुलांना 'बैलोबा'. आम्हाला मुले झाल्यावर ही प्रेमाची बिरुदे ते नातवंडांना लावू लागले.
{{gap}}"ह्यांनी आपलं सर्व आयुष्य स्त्रियांच्या उन्नतीकरिता वेचलं..." बाई बोलत होत्या तिकडे माझे लक्ष गेले. हे उदगार बाबांबद्दल खास नव्हते. "ह्यांनी काढलेल्या स्त्री-शिक्षण संस्था सुपरिचित आहेत." अस्से, अस्से. आता मामंजींबद्दल बोलत आहेत वाटते. ठीक, चालू द्या. आहे अजून बराच अवकाश. मी जरा पाय लांबवले, कोचावर अंग जरा जास्त रेलले व डोळे फार वेळ न मिटण्याचा निश्चय केला. "सर्व स्त्रियांना त्यांनी आपल्या ऋणात बांधलं आहे." माझी ओळख करून देणे चालूच होते- खरंच, मामंजीनी मला कोणत्या ऋणात बांधले आहे? त्यांच्या मुलाची बायको म्हणून मी त्यांची ह्यापलीकडे त्यांच्या-माझ्यात काही बंधन होते का? लग्न होऊन मी घरी आले तेव्हा निदान सासरचे वडील माणूस म्हणून फक्त कर्तव्यभावना तरी होती. त्यांचीही माझ्याबद्दलची भावना अशीच असावी. मुलाला आवडली ना, मग माझे म्हणणे नाही. एका माणसासाठी सर्वस्वी अनोळखी माणसांत मी जाऊन पडले होते. ती माझ्याबद्दल साशंक होती, मी त्यांच्याबद्दल होते. लौकिकात मी त्यांना व त्यांनी मला आपले म्हटले होते. पण मने मिळायची होती. त्याच्यासाठी किती तरी काळ लोटायचा होता. मला त्यांचे करायचे होते, त्यांनी माझ्या उपयोगी पडायचे होते. किती भांडणे व्हायची होती, कितीदा समजुती काढायच्या होत्या! प्रत्येक सासुरवाशीण ह्याच चक्रातून जात असणार, सासरची माणसे हीन असली तर ज्या माणसाच्या प्रेमामुळे मुलगी घरात आली त्याचेसुद्धा प्रेम नाहीसे करून तिला निराधार करून टाकतील. पण माझ्या सासरची माणसे सुवृत्त, चारित्र्यसंपन्न अशी होती. दर भांडणातून, आयुष्यातील दर प्रसंगातून, प्रेमाची नवी-नवी बंधने निर्माण होत होती, व आज माझी मुले केवळ आईबापांच्या नाही. तर काका-काकूंच्या मामा-मामींच्या व दोन्ही आजोबा-आजींच्या प्रेमाच्या उबेत वाढत होती, मामंजी तर माझ्या घरात चालताबोलता आशीर्वाद नाहीत का?
{{gap}}"कॉलेजात ते शास्त्र शिकवितात." बाईचे शब्द परत ऐकू आले. "त्यांनीही वडिलांप्रमाणे आपल्याला शिक्षणकार्याला वाहून घेतल आहे." मामंजी संपून आता ह्या बाई माझ्या नवऱ्याकडे वळलेल्या दिसतात. काय वरवरचे बोलत असतात माणसे! ह्यांना माहीत तरी आहे का ता का तो कसा आहे<noinclude></noinclude> t5j0733huedrv8giqlvbuecffi9tnn7 पान:Paripurti.pdf/143 104 20965 230203 73182 2026-05-19T10:48:28Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230203 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{RunningHeader|||परिपूर्ती / १५७ }}</noinclude>ते? विषयसुद्धा कोठचा शिकवतो ते धड माहीत नाही, मग बाकीचे काय सांगणार कपाळ! माझे मन परत घरगुती स्मृतींच्या जाळ्यात गुरफटले. थोरली मुले आजोबांना भिऊन असत; पण धाकटीला मात्र आजोबा म्हणजे तिची मालमत्ता वाटते जणू. आणि आजोबांनासुद्धा कितीही कामात असले तरी तिच्या आग्रही अप्पलपोट्या प्रेमापुढे हार खावी लागते. आजोबाच काय घरातील प्रत्येक माणूस सर्वस्वी तिचे पाहिजे. संध्याकाळी आम्ही जरा एकमेकांजवळ बसून बोलत असलो की, हिला ते मुळीच खपत नाही... ताबडतोब मध्ये घुसते, त्याचे तोंड आपल्या हातात धरते व सांगू लागते, "बरं का दिनू, आज कनी मला मास्तर म्हणाले..." ती मामाकडे गेली म्हणजे घरात निवांत बोलत बसता येते. पण आता अगदी दोघांच्याच अशा गोष्टी बोलाव्यात तरी कुठे लागतात? एकमेकांची मनःस्थिती कळायला बोलायची गरज आहेच कुठे? पाठमोरा असला तरी नाही का मला समजत की, आज काही तरी बिघडले आहे म्हणून? मला लांबूनच पाहून तो नाही का विचारीत, "आज काय ग झालं आहे?" ठण... घड्याळात अर्ध्या तासाचा ठोका वाजला. ओळख करून देणाऱ्या बाईंची गडबड उडाली. "तेव्हा ह्या... ची कन्या आहेत. सुप्रसिद्ध महर्षी ह्यांच्या सूनबाई, सुप्रसिद्ध प्राध्यापक ह्यांच्या पत्नी आहेत, व स्वतःसुद्धा शिकलेल्या आहेत. मी त्यांना आता भगिनींना चार शब्द सांगण्याची विनंती करते." असे म्हणून त्या झटकन खाली बसल्या. मला थोडे हसू आले. माझ्या भटक्या मनाला आवरून माझे भाषण केले व समारंभ आटोपला.
{{gap}}पण बाईंनी करून दिलेली ओळख अपूर्ण आहे व तीत काहीतरी राहिले ही हुरहूर मनाला लागली ती काही जाईना. दोन दिवसांनी मी घाईघाईने रस्त्यातून जात होते. संध्याकाळ संपत आली होती, पण रात्र अजून पडली नव्हती. रस्त्याच्या कडेने मुलांचे घोळके घराच्या दारापुढून उभे होते. चार भिंतींच्या कोंडवाड्यात जाण्याचा क्षण ती जरा पुढे ढकलीत होती. त्यांच्या गप्पांतील शब्द अधूनमधून माझ्या कानांवर येत होते. इतक्यात जवळच्याच एका घोळक्यातून शब्द ऐकू आले, "अरे, शूः, शूः, पाहिलीस का? ती बाई जाते आहे ना, आपल्या वर्गातल्या कर्व्याची आई बरं का..."
{{gap}}... मी थांबले. पण चुटकी वाजवली. त्या दिवशी बाईंनी सांगितलेली ओळख आज पुरी झाली. बाई हे सांगायच्या विसरल्या होत्या, नव्हे का?
{{right|{{xx-larger|☆}}}}<noinclude></noinclude> lbqjbjon5eiul4poi5y5y6mx7we664m पान:Paripurti.pdf/144 104 20966 230204 73191 2026-05-19T10:50:00Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230204 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop |Image = परिपूर्ती_(Paripurti).pdf |Page = 144 |bSize = 450 |cWidth = 452 |cHeight = 429 |oTop = 3 |oLeft = 0 |Location = center |Description = }}<noinclude></noinclude> riawxseo2h6orp60435ygy3wz24b46r बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी 0 32206 230150 157706 2026-05-18T16:52:24Z QueerEcofeminist 918 "[[बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 157706 wikitext text/x-wiki <pages index="बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी (Banket Paul Takanyapurvi).pdf" from=1 to=36/> [[वर्ग:ज्ञान प्रबोधिनी]] 5t52yq1uqw6qwi2113tmd91vq4d7avv मृच्छकटिक 0 32368 230151 147409 2026-05-18T16:53:12Z QueerEcofeminist 918 "[[मृच्छकटिक]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 147409 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = मृच्छकटिक | साहित्यिक = शूद्रक | अनुवादक = अमरेंद्र | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="मृच्छकटिक.pdf" include="1" /> {{dhr}}{{page break|label=}}{{dhr}} <pages index="मृच्छकटिक.pdf" include="2" /> {{dhr}}{{page break|label=}}{{dhr}} <pages index="मृच्छकटिक.pdf" include="3" /> {{dhr}}{{page break|label=}}{{dhr}} <pages index="मृच्छकटिक.pdf" include="4" /> {{dhr}}{{page break|label=}}{{dhr}} <pages index="मृच्छकटिक.pdf" include="5" /> {{dhr}}{{page break|label=}}{{dhr}} <pages index="मृच्छकटिक.pdf" from="6" to="33" /> {{dhr}}{{page break|label=}}{{dhr}} <pages index="मृच्छकटिक.pdf" include="34" /> {{dhr}}{{page break|label=}}{{dhr}} [[वर्ग:तपासणी करायची पुस्तके]] [[वर्ग:नाटक]] [[वर्ग:शुद्रक]] 698hs34hqbj2wfzguqtkq40owe523ai लोक संस्कृतीचा गाभारा 0 68854 230152 141758 2026-05-18T16:53:37Z QueerEcofeminist 918 "[[लोक संस्कृतीचा गाभारा]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 141758 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = लोक संस्कृतीचा गाभारा | साहित्यिक = राजेंद्र माने | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = २००९ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="लोक संस्कृतीचा गाभारा (Lok Sanskruticha Gabhara).pdf" from=1 to=171/> aq3yy7pmbzh9d88a26unf56xhdhfu7m पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६१ 104 85715 230144 181881 2026-05-18T12:02:26Z JayashreeVI 4058 230144 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|५६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>जो दुसऱ्याचें अंतर जाणें । देशकाळ प्रसंग जाणें । तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला । वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ॥ ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु । 'वर्णाना ब्राह्मणो गुरुः' । ऐसें हें वचन || ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले । गुरुत्व सांडून झाले । शिष्य शिष्याचे || कित्येक दावलमलकास जाती । कित्येक पिरासी भजती । कित्येक तुरुक होती । आपुले इच्छेनें ॥ ऐसा कलीयुगीं आचार । कोठें राहिला विचार । पुढें पुढें वर्णसंस्कार । होणार आहे || गुरुत्व आलें नीच याती । कांहीं एक वाढली महंती । शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥ हें ब्राह्मणांस कळेना । त्याची वृत्ति च वळेना । मिथ्या अभिमान गळेना | मूर्खपणाचा || राज्य नेलें म्लेंच्छक्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं । आपण अरत्रींना परत्रीं । कांहींच नाहीं ॥ ब्राह्मणांस ग्रामण्यानें बुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिरवलें । त्याच विष्णूनें शापिलें । परशुरामा || आम्हीही तेचि ब्राह्मण | दुःखें बोलिलों हें वचन | वडील गेले ग्रामणी करून । आम्हां भोंवते ॥ आतांच्या ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें । तुम्हां बहुतांचे प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥ बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्मणांचें अदृष्ट जाणावें । प्रसंग बोलिलों स्वभावें । क्षमा कीजे ॥</poem>}} {{gap}}या दशकाचे शेवटचे तीन अध्याय मात्र पुनः अध्यात्मपर आहेत व--<noinclude></noinclude> qy7053ukxmp0ykdx36oijnp8dsazt4w 230145 230144 2026-05-18T12:03:11Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 230145 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|५६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>{{block center|<poem>जो दुसऱ्याचें अंतर जाणें । देशकाळ प्रसंग जाणें । तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला । वेदशास्त्र ब्राह्मणाला । कोण पुसे ॥ ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु । 'वर्णाना ब्राह्मणो गुरुः' । ऐसें हें वचन || ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले । गुरुत्व सांडून झाले । शिष्य शिष्याचे || कित्येक दावलमलकास जाती । कित्येक पिरासी भजती । कित्येक तुरुक होती । आपुले इच्छेनें ॥ ऐसा कलीयुगीं आचार । कोठें राहिला विचार । पुढें पुढें वर्णसंस्कार । होणार आहे || गुरुत्व आलें नीच याती । कांहीं एक वाढली महंती । शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणांचा ॥ हें ब्राह्मणांस कळेना । त्याची वृत्ति च वळेना । मिथ्या अभिमान गळेना | मूर्खपणाचा || राज्य नेलें म्लेंच्छक्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं । आपण अरत्रींना परत्रीं । कांहींच नाहीं ॥ ब्राह्मणांस ग्रामण्यानें बुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिरवलें । त्याच विष्णूनें शापिलें । परशुरामा || आम्हीही तेचि ब्राह्मण | दुःखें बोलिलों हें वचन | वडील गेले ग्रामणी करून । आम्हां भोंवते ॥ आतांच्या ब्राह्मणी काय केलें । अन्न मिळेना ऐसें झालें । तुम्हां बहुतांचे प्रचीतीस आलें । किंवा नाहीं ॥ बरें वडिलांस काय म्हणावें । ब्राह्मणांचें अदृष्ट जाणावें । प्रसंग बोलिलों स्वभावें । क्षमा कीजे ॥</poem>}} {{gap}}या दशकाचे शेवटचे तीन अध्याय मात्र पुनः अध्यात्मपर आहेत व--<noinclude></noinclude> hwt1if3q0sjt2fhu93adxaymqf2vav3 काशीयात्रा 0 108263 230153 223150 2026-05-18T16:54:16Z QueerEcofeminist 918 "[[काशीयात्रा]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 223150 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = काशीयात्रा | साहित्यिक = हरी गणेश पटवर्धन | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = १८७२ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="काशीयात्रा.pdf" from=1 to=94 /> amfmnlkg13g02hzmj1qakh9cqou41v6 भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी 0 108436 230149 224384 2026-05-18T16:51:54Z QueerEcofeminist 918 "[[भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 224384 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी | साहित्यिक = मथुराबाई मोरेश्वर जोशी | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = १९१३ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी.pdf" from=1 to=56 /> qhcndhhbe9ra3hupobmqvkag7q5aqei सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५ 0 109170 230146 226270 2026-05-18T16:49:17Z QueerEcofeminist 918 "[[सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 226270 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५ | साहित्यिक = | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = १९२३ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५.pdf" from=1 to=12 /> 57klvytxao4sgbw6p496aq78je8s4fu मराठी दुसरें पुस्तक (बालबोध) 0 109293 230148 226539 2026-05-18T16:51:10Z QueerEcofeminist 918 "[[मराठी दुसरें पुस्तक (बालबोध)]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 226539 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = मराठी दुसरें पुस्तक (बालबोध) | साहित्यिक = | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = १९०७ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="मराठी दुसरें पुस्तक (बालबोध).pdf" from=1 to=119 /> s1terda3cg05ek5v2skttjy15a54u1p बालबोध पुस्तक चौथे 0 109459 230147 226773 2026-05-18T16:50:43Z QueerEcofeminist 918 "[[बालबोध पुस्तक चौथे]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 226773 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = बालबोध पुस्तक चौथे | साहित्यिक = | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = १८८५ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="बालबोध पुस्तक चौथें.pdf" from=1 to=157/> 9e8z5an5ptztyiq71cnntbb7u4lzkq0 आर्य-स्त्री-रत्ने 0 110249 230154 229587 2026-05-18T16:54:34Z QueerEcofeminist 918 "[[आर्य-स्त्री-रत्ने]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 229587 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = आर्य-स्त्री-रत्ने | साहित्यिक = यशोदाबाई भट | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = [[आर्य-स्त्री-रत्ने/पतीचा उद्धार करणारी चुडाला|पतीचा उद्धार करणारी चुडाला]] | वर्ष = 1917 | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="आर्य-स्त्री-रत्ने.pdf" from="1" to="8" /> hd3a6rin5lvk9i8f2w1g005nubduyue