विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.3 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk सदस्य:कल्पनाशक्ती 2 66162 230206 229611 2026-05-20T08:18:57Z कल्पनाशक्ती 3813 230206 wikitext text/x-wiki मला मराठी साहित्याची आवड आहे. Contest: Ratnagiri-GJC-OJT NEP Pilot-Sanskrit Wikisource Project
Start date and time: 2025-12-02 00:00:01 UTC
End date and time: 2026-06-16 23:59:59 UTC
https://wscontest.toolforge.org/c/342 Contest: Wikimedia Education Program - National Education Policy Pilot Project at Fergusson College, Pune Start date and time: 2026-01-28 00:00:01 UTC End date and time: 2026-06-30 23:59:59 UTC https://wscontest.toolforge.org/c/354 Goa University Workshops for Konkani Wikisource 26, 27, 28 Feb 2026
1.      26th February 2026- Government College of Arts Science and Commerce, Qupem, Goa
2.      27th and 28th February 2026- Cuncolim Educational Society’s College of Arts and Commerce.-
proofreading of a book by Ravindra Kelekar; तुळशी and partial proofreading of book अघळ पघळ == following books can be accessed using wikireader app == === शरद जोशी === ग्रंथ संख्या - १३ [[शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती|शेतकरी संघटना : विचार आणि कार्यपद्धती]], [[चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न|चांदवडची शिदोरी स्त्रियांचा प्रश्न]], [[शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख|शेतकऱ्यांचा राजा शिवाजी आणि इतर लेख]], [[खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने|खुल्या व्यवस्थेकडे खुल्या मनाने]], [[अंगारमळा|अंगारमळा]], [[अन्वयार्थ - १|अन्वयार्थ - १]] (Linked to English Wikipedia), [[अन्वयार्थ – २|अन्वयार्थ – २]] (Linked to English Wikipedia), [[माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो...|माझ्या शेतकरी भावांनो आणि मायबहिणींनो...]], [[बळीचे राज्य येणार आहे!|बळीचे राज्य येणार आहे!]] (Linked to English Wikipedia), [[अर्थ तो सांगतो पुन्हा|अर्थ तो सांगतो पुन्हा]] (Linked to English Wikipedia), [[पोशिंद्याची लोकशाही|पोशिंद्याची लोकशाही]] (Linked to English Wikipedia), [['भारता'साठी|'भारता'साठी]] (Linked to English Wikipedia), [[राखेखालचे निखारे|राखेखालचे निखारे]] (Linked to English Wikipedia) === जाई निंबकर === ग्रंथ संख्या - ४ [[साथ|साथ]], [[कमळाची पानं|कमळाची पानं]], [[अर्धुक|अर्धुक]], [[अ‍ॅलिस|अ‍ॅलिस]] === शैला लोहिया === ग्रंथ संख्या - ११ कादंबऱ्या- [[इत्ता..इत्ता..पाणी|इत्ता इत्ता पाणी]], [[शोध अकराव्या दिशेचा|शोध अकराव्या दिशेचा]] कथासंग्रह- [[आपले आभाळ पेलताना|आपलं आभाळ पेलताना]], [[कथाली|कथाली]], [[मनतरंग|मनतरंग]], [[तिच्या डायरीची पाने|तिच्या डायरीतील पाने]] कविता संग्रह- [[कविता गजाआडच्या|कविता गजाआडच्या]] अन्य ललित वाङ्मय- [[रुणझुणत्या पाखरा|रुणझुणत्या पाखरा]], [[वाहत्या वाऱ्यासंगे|वाहत्या वाऱ्यासंगे]], [[स्वरांत|स्वरान्त]] संशोधन / समीक्षा ग्रंथ- [[भूमी आणि स्त्री|भूमी आणि स्त्री]] === नरहर कुरूंदकर === ग्रंथ संख्या - ४ [[हैदराबाद विमोचन आणि विसर्जन|हैदराबाद विमोचन आणि विसर्जन]], [[वाटचाल|वाटचाल]] (Linked to English Wikipedia), [[पायवाट|पायवाट]] (Linked to English Wikipedia), [[परिचय|परिचय]] (Linked to English Wikipedia), [[ओळख]] ===इरावती कर्वे === ग्रंथ संख्या - १+ 3 [[भोवरा|भोवरा]] (Linked to English Wikipedia), verified- [[परिपूर्ती]], [[गंगाजल]], [[युगान्त]], I have not worked on this- [[आमची संस्कृती]] ===दत्तात्रय बळवंत पारसनीस=== ग्रंथ संख्या - १ [[बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र|बायजाबाईसाहेब शिंदे ह्यांचे चरित्र]] === डॉ. सुधा कोठारी === ग्रंथ संख्या - १ [[‘चैतन्य’ चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन|‘चैतन्य’ चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन]] ===[https://mr.wikipedia.org/wiki/पुरुषोत्तम_गणेश_सहस्रबुद्धे][[w:पुरुषोत्तम_गणेश_सहस्रबुद्धे|पु. ग. सहस्रबुद्धे]] === ग्रंथ संख्या - १३ प्रबंध- [[महाराष्ट्र संस्कृती|महाराष्ट्र संस्कृती]] linked to marathi wikipedia, [[विज्ञान-प्रणीत समाजरचना|विज्ञान-प्रणीत समाजरचना]] linked to marathi wikipedia, [[साहित्यातील जीवनभाष्य|साहित्यातील जीवनभाष्य]] linked to marathi wikipedia निबंध-संग्रह- (all linked to marathi wikipedia)- [[माझे चिंतन|माझे चिंतन]], [[वैय्यक्तिक व सामाजिक|वैय्यक्तिक व सामाजिक]], [[भारतीय लोकसत्ता|भारतीय लोकसत्ता]], [[भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म|भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म]], [[इहवादी शासन|इहवादी शासन]], [[हिंदुसमाज संघटना आणि विघटना|हिंदुसमाज संघटना आणि विघटना]], [[लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान|लोकसत्तेला दण्डसत्तेचें आव्हान]], [[सौंदर्यरस|सौंदर्यरस]], [[लोकहितवादींची शतपत्रे|लोकहितवादींची शतपत्रे]], [[केसरीची त्रिमूर्ति|केसरीची त्रिमूर्ति]] === [[w:श्रीपाद_महादेव_माटे|श्री. म. माटे]] === मराठी विकिपीडिया - https://w.wiki/AykH ग्रंथ संख्या - ३ (all linked to marathi wikipedia) [[पाश्चात्य पुरुषश्रेष्ठ|पाश्चात्य पुरुषश्रेष्ठ]], [[कर्तबगार स्त्रिया|कर्तबगार स्त्रिया]], [[अस्पृश्य -विचार|अस्पृश्य -विचार]] === [[साहित्यिक:पांडुरंग सदाशिव साने]] === साने गुरुजी मराठी विकिपीडिया - https://w.wiki/AykX ग्रंथ संख्या - ३ [[पुरातत्वभूषण कै. इतिहासाचार्य राजवाडे यांचे चरित्र]] linked to marathi wikipedia, [[ना. गोखले चरित्र]] linked to marathi wikipedia, [[इस्लामी संस्कृति खंड पहिला मुहंमद पैगंबर चरित्र]], [[कला आणि इतर निबंध]], [[हिमालयाची शिखरें]], [[भारतीय नारी]]- validation wikidata entry, [[आपण सारे भाऊ]]- validation wikidata entry, [[स्त्री-जीवन]], [[देशबंधु दास]] === काशिनाथ नारायण साने === ग्रंथ संख्या - १ [[श्रीमंत नारायणराव पेशवे यांची बखर]] Reader App साठी खालील पुस्तकांवर काम केले. [[महाबळेश्वर]]- चुका दुरुस्ती, wikidata entry, [[मराठी रंगभूमि]]- चुका दुरुस्ती, wikidata entry, [[अंगारवाटा...शोध शरद जोशींचा]]- चुका दुरुस्ती, wikidata entry === हमीद दलवाई , मेहरून्नीसा दलवाई === [[कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा]]- चुका दुरुस्ती, wikidata entry, [[राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान]]- चुका दुरुस्ती, wikidata entry, [[मी भरून पावले आहे]], [[लाट]], === सुनीलकुमार लवटे === [[प्रशस्ती]], [[शब्द सोन्याचा पिंपळ]], [[वाचावे असे काही]], [[मराठी वंचित साहित्य]], [[प्रेरक चरित्रे]], [[एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न]], [[वि. स. खांडेकर चरित्र]], [[कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक]], [[जाणिवांची आरास]] === श्री. ग. माजगावकर === [[श्रीग्रामायन]], [[निर्माणपर्व]], [[बलसागर]] === तारा भवाळकर === [[मनातले जनात (स्त्री विषयक लेखसंग्रह )]], [[लोकसाहित्याच्या अभ्यासदिशा]], [[मधुशाला]], [[यक्षगान आणि मराठी नाट्य-परंपरा]], [[राणीसाहेब रुसल्या]] ===लक्ष्मीकांत देशमुख=== [[पाणी! पाणी!!]], [[प्रशासननामा]] ===वर्षा देशपांडे=== [[कोयत्याच्या मुठीत]] ===हरि नारायण आपटे=== [[स्फुट गोष्टी भाग तिसरा]], [[स्फुट गोष्टी भाग ४ था]], [[मराठी वाड्मयाचा अभ्यास]] === धर्मानंद दामोदर कोसंबी === [[बुद्ध, धर्म आणि संघ]], [[निवेदन]] ===रा. द. रानडे (गुरुदेव रानडे)=== [[नित्यनेमावली]], [[रामदासवचनामृत]], [[श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ]]- लेखक वसंतराव देशपांडे === इतर === [[सोट्याह्मसोबा मेळ्याची पदें शके १८४५]], [[बालबोध पुस्तक चौथे]]- 1885, [[मराठी दुसरें पुस्तक (बालबोध)]], [[भावी आयुष्य सुखमय करण्याची तरुण पिढीवर असलेली जबाबदारी]], [[बँकेत पाऊल टाकण्यापूर्वी]], [[मृच्छकटिक]]- अमरेंद्र, [[लोक संस्कृतीचा गाभारा]]- राजेंद्र माने, [[इचलकरंजी संस्थानाचा इतिहास]]- वासुदेव वामन खरे, [[काशीयात्रा]], [[आर्य-स्त्री-रत्ने]]- यशोदाबाई भट ct6i1wrkv9yg9jjl5mlcnzz6vgz96aw पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२४ 104 110011 230209 229386 2026-05-20T08:31:31Z कल्पनाशक्ती 3813 230209 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्त्वज्ञानी.'''</noinclude>{{gap}}"या डेलफाय देवाच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय? असा मी विचार करूं लागलों. मला तर मुळींच शहाणपण नाहीं, हे मला ठाऊक आहे. तेव्हां देवाच्या म्हणण्याचा अर्थ काय? देव तर खोटे बोलणार नाहीं. कारण तो देवच आहे. शेवटी देवाचें म्हणणें खरें आहे कीं खोटें आहे याचा खालील पद्धतीप्रमाणे मी पडताळा पाहण्याचा निश्चय केला. शहाणपणाबद्दल अत्यंत नाणावलेल्या एका मुत्सद्याकडे मी गेलों व त्याला पुष्कळ प्रकारचे प्रश्न विचारून त्याच्याशी संभाषण केलें, त्यावरून मला असे समजलें कीं, जरी त्याला सर्व लोक ज्ञानी समजतात, व तो आपल्या स्वतःलाही ज्ञानी समजतो, तरी पण तो अज्ञानी आहे व या अज्ञानाची त्याला जाणीव नाहीं. तेव्हां मी व तो या दोघांनाही ज्ञान नाही असे दिसले. माला माझ्या अज्ञानाची मला जाणीव होती, पण त्याला मात्र ती नव्हती. तेव्हां या बाबतींत मी त्याच्यापेक्षां शहाणा खरा, असें अनुभवास आले. पुढे मी एका कवीकडे गेलों. परंतु त्याला आपल्या कवितेबद्दल व आपल्या कवनपद्धतीबद्दल कांहींच ज्ञान नाहीं असे मला दिसून आलें. तेव्हां मी ताडलें की कवींना आपल्या कलेचे ज्ञान नसते, ते कविता करतात खऱ्या, परंतु त्या ज्ञानानें नव्हे तर साहजिक स्फूर्तीनें करतात. पुढे मी कारागिरांकडे गेलों, त्यांना माझ्यापेक्षां जास्त शहाणपण असेल असे मला वाटलें. त्यांना आपल्या कलेबद्दल व धंद्याबद्दल माहिती होती खरी, परंतु या एका प्रकारच्या ज्ञानावरून आपल्याला सर्व त-हेचेंज्ञान आहे असे त्यांना वाटत असे. या बाबतीतही मी त्यांचेपेक्षां बरा, असे मला दिसून आलें. याप्रमाणे देवाच्या जणुं कांहीं आज्ञेनेंच मी आपला व्यवसाय चालविला होता. परंतु यामुळे मी आपल्याला जास्त जास्त शत्रु करीत होतों. ज्याच्या ज्याच्या जवळ संभाषण करून मी त्याला कुंठित करून त्याचें अज्ञान दाखवीत असे, तो तो मनुष्य आपल्या अज्ञानाला दोष न ठेवता मलाच शिव्या देई.! तरुण मंडळी हा वादविवाद पहात असत. तेव्हां त्यांना मी जास्त शहाणा आहे असे वाटे व माझ्या<noinclude>{{center|१८}}</noinclude> 1bpdk62ah4umnzwkk8q0m1b4lz6zniv पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२८ 104 110015 230210 230085 2026-05-20T08:34:02Z कल्पनाशक्ती 3813 230210 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>व या उपकारांची खरी फेड म्हणजे आपल्याला आपल्या उतार वयांत शहराने आपल्या खर्चाने पोषण करणे ही होय असे सांगितले. परंतु मित्राच्या मुर्वतीखातर व न्यायाधिशाच्या समजुतीखातर साक्रेटिसानें तीस मिनींचा दंड देण्यास आपण कबूल आहो असे जाहीर केले.
{{gap}}मते घेतल्यावर असे दिसून आले की, पहिल्यापेक्षां पुष्कळच जास्त मताने सॉक्रेटिसास मरणाची शिक्षा देण्यात आली. ही शिक्षा ऐकून त्याला मुळीच वाईट वाटले नाही. मात्र आपल्याला अन्यायाने शिक्षा दिल्याबद्दल तुम्हांला पुढे पश्चात्ताप होईल असे सॉक्रेटिसाने भविष्य सांगितले.
{{gap}}शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, "परंतु आतां वेळ झाली व आपण येथून निघाले पाहिजे, मी मरायला जाणार, आपण जगण्यास जाणार, पण आयुष्य जास्त चांगले किंवा मृत्यु जास्त चांगला, हे फक्त देवालाच ठाऊक ! ! !"
{{Css image crop |Image = तीन_तत्त्वज्ञानी.pdf |Page = 28 |bSize = 582 |cWidth = 143 |cHeight = 162 |oTop = 317 |oLeft = 204 |Location = center |Description = }}{{nop}}<noinclude>{{center|२२}}</noinclude> aa60lqjektgtkyfm5tmmnqahcui3i0o पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२९ 104 110016 230211 230086 2026-05-20T08:39:38Z कल्पनाशक्ती 3813 230211 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|(३)}} {{center|{{xx-larger|'''साक्रेटिसाचा तुरुंगवास.'''}}}} {{rule|7em}} {{gap}}साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली ती कांहीं आगंतुक कारणांनी नाही. त्याचा तुरुंगवास मात्र आगंतुकच होता. त्याची शिक्षा ही मानवी स्वभावांत असलेल्या दोन परस्परविरोधी तत्वांचा परिणाम होय. या दोन तत्वांच्या झगड्यांत मनुष्यमात्राची प्रगति घडून आलेली आहे. साकेटीस व त्याचे प्रतिपक्षी यांच्या तंट्याचे मूळ या तत्त्वांत आहे. साक्रेटीस हा नव्याचा अभिमानी होता, तर त्याचे प्रतिपक्षी हे जुन्याचे अभिमानी होते; तो सुधारणावादी होता, तर ते रूढिवादी होते; साक्रेटिसाला डोळस अशी धर्मभक्ति पाहिजे होती, तर त्यांना अंधधर्मश्रद्धा हवी होती; साक्रेटिसाची पारमार्थिक दृष्टि होती, पर त्यांची सांसारिक दृष्टि होती; तो खऱ्याचा भोक्ता होता, तर ते आभासावर भिस्त ठेवणारे होते; त्याला अस्सल पाहिजे होते, तर त्यांचे नकलेवर समाधान होत होते; तो दूरदृष्टि होता, तर ते संकुचितदृष्टि होते; तो स्वार्थपराङ्मुख होता, तर ते स्वार्थपरायण होते. याप्रमाणे परस्परविरोधी तत्त्वांच्या वालींचा झगडा अपरिहार्यच होता, व या झगड्यांत साक्रेटिसाच्या प्रतिपक्षीयांचा क्षणैक विजयहि झाला खरा. परंतु आपल्या अन्यायी कृत्याबद्दल पुढे अथीनियन लोकांना इतका पश्चात्ताप झाला की, ज्या पुरुषाला त्यांनी गुन्हेगार म्हणून विष प्राशन करावयास लावले त्यालाच त्यांनी पुरुषश्रेष्ठाचा मान दिला व त्याच्या पश्चात् त्याचे विलक्षण गौरव केलें, साक्रेटिसाचा तुरुंगवास ही मात्र एक आकस्मिक गोष्ट होती व त्याचे कारणहि क्षुल्लकच होते व केव्हां केव्हां क्षुल्लक गोष्टीपासून फार मोठे परिणाम झालेले आपण पाहतो त्या कोटीपैकी हा तुरुंगवास होता. अथीनियन लोकांचे- नव्हे<noinclude>{{center|२३}}</noinclude> kqsci5jp8zpphr513fe4mos3kgw4mhf पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३० 104 110017 230212 230087 2026-05-20T08:43:03Z कल्पनाशक्ती 3813 230212 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>सर्व जगाचे-सुदैव की, साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली असतांना सुमारे एक महिना त्याला तुरुंगवास भोगावा लागला व यामुळे त्याच्या अंगच्या कित्येक गुणांचे प्रदर्शन झाले. हे तुरुंगांतील दिवस साक्रेटिसाने मोठ्या शांत वृत्तीने व मोठ्या आनंदांत घालविले. या दिवसांत त्याने आपल्या आजन्मव्यवसायाला खळ पडू दिला नाही. तुरुंगांत त्याच शिष्य व परकीय लोक येत व त्यांच्याशी निरनिराळ्या विषयांवर वादविवाद करीत. असा क्रम थेट त्याच्या मरणाच्या क्षणापर्यंत चालला होता. शिक्षा झालेली असूनहि आपले कर्तव्यकर्म करीत असतांना साक्रेटिसाला मरण आले हे त्याचे केवढे भाग्य ! असें भाग्य फारच थोड्यांच्या वाट्यास येते. असो.
{{gap}}डेलॉस या बेटावर असलेल्या डेलफॉय देवावर अथोनियन लोकांची फार भक्ति होती. ते त्या देवाला आपला संरक्षक देवच मानीत. यामुळे दरवर्षी एका विवक्षित वेळी एक स्वतंत्र गलबत नगरातर्फे या देवाच्या पूजेअर्चेकरितां पाठविण्यात येत असे. अथेन्सच्या बंदरांतून हे गलबत सुटल्यापासून परत येईपर्यंतचा काळ- याला सुमारे महिना लागे-पवित्र व धार्मिक मानला जात असे, व या पर्वणींत कोणत्याहि माणसाला मरणाची शिक्षा दिली जात नसे. साक्रेटिसाच्या खटल्याचा ज्या दिवशी निकाल झाला त्याच दिवशी हे गलबत बंदरांतून हाकारल्यामुळे साकेटिसाची मरणाची शिक्षा ताबडतोब अमलांत आली नाहीं, व या कारणाने त्याला महिनाभर तुरुंगांत काढावा लागला व तो साक्रेटिसाने कशा प्रकाराने घालविला याचे दिग्दर्शन वर आलेच आहे.
{{gap}}साक्रेटिसच्या तुरुंगवासास जवळ जवळ महिना होत आला असतांना एके दिवशी अगदी पहाटेस साक्रेटिसाचा पूर्वीचा शिष्य व उतारवयांतील मित्र क्रिटो हा तुरुंगांतील साक्रेटिसाच्या खोलीशी आला. परंतु त्याला गाढ झोप लागली आहे असे क्रिटोला समजले. हे पाहून आपल्या गुरूच्या शांत व आनंदी वृत्तीबद्दल त्याला सप्रेम कौतुक वाटले, साक्रोटिस आपोआप जागा झाल्याबरोबर त्याने आपल्या मित्राची विचार<noinclude>{{center|२४}}</noinclude> j5wutfd1jr459jg9maywqcopik55qbe पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३१ 104 110018 230213 230088 2026-05-20T08:44:46Z कल्पनाशक्ती 3813 230213 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>पूस करून इतक्या पहांटेस येण्याचे कारण विचारले, तेव्हां क्रिटोने डेलासला गेलेले गलबत आज येणार अशी दुःखदायक बातमी आली आहे असे मोठा सुस्कारा टाकून सांगितले. साक्रेटिसास ही बातमी ऐकून काहीएक वाईट न वाटतां उलट ही सुदैवाची बातमी आहे असेंच त्याला वाटले. परंतु तो म्हणाला "गलबत आज येईल असे मला वाटत नाही. कारण आतांच एक शुभ्र वस्त्र परिधान केलेली सुंदर स्त्री माझ्या स्वप्नांत आली व ती मला म्हणाली:-
{{gap}}"आज पासूनी तिसरे दिवशी जाशिल तूं यमलोकाला!' तेव्हां तुम्ही मला उठविले नाही हे चांगले केले; पण तुमचे येण्याचे कारण सांगा."
{{gap}}क्रिटो मोठया कळकळीने बोलला "गुरुजी, मी आपल्याला किती तरी वेळा विनति केली आहे व आतां ही शेवटची करीत आहे. आपण आपल्या जीवाची उगाच आहुती घालीत आहां. या आपल्या करण्याने आम्ही आपल्या मित्रांनी आपली सुटका करण्याचा काही प्रयत्न केला नाही, असा आमच्यावर जनापवाद राहील. मी आपल्याला सांगतो की, मी आपल्या सुटकेची सर्व तयारी करून ठेविली आहे. तुरुंगावरच्या सर्व अधिकाऱ्यांची समजी केली आहे. या कामाला फारसा खर्च येतो अशांतला प्रकार नाही, व जरी माझी सर्व संपत्ति या कामी खर्च झाली तरी मी ती करण्यास एका पायावर तयार आहे. आपण आपल्या मित्राच्या साहाय्याने तुरुगांतून निघून गेल्यास आपल्या मित्रांना सरकाराकडून त्रास, दगदग व खर्च सोसावा लागेल, या भीतीने जर आपण माघार घेत असाल तर त्याबद्दल आपण अगदी बेफिकीर असा. आमचे आम्ही पाहून घेऊ! दुसऱ्या शहराचे लोक आपले आदरातिथ्य करण्यास व आपल्यास आश्रय देण्यास उत्सुक आहेत. सर्व व्यवस्था मी थेसलींत करून ठेविली आहे. आपला नुसता रुकार पाहिजे आहे. शिवाय,जीव जगविणे हातांत असतां तो जाणूनबुजून घालविणे हे पाप नाही का? आणखी असें पहा, आपण सडे नाहीत आपल्याला मुलेबाळे आहेत; ज्यांचे संगोपन करणे व त्यांना शिक्षण देऊन उत्तम नागरिक बनविणे<noinclude>{{center|२५}}</noinclude> q9yitff0cgyn3nd86i7n1covbgi4h0z पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३३ 104 110020 230214 230090 2026-05-20T08:48:14Z कल्पनाशक्ती 3813 230214 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>कारणांचा येथे संबंध येत नाही. आपले करणे सुविचाराला पटते किंवा नाही, हाच काय तो आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रिय क्रिटो ! मी करीत आहे हे युक्तीस व सुविचारास धरून आहे, अशी माझी पूर्ण खातरी आहे व तुमचीहि तशीच व्हावी अशी माझी इच्छा आहे. जनतेच्या मताला मान देण्याचे कारण नाही, हे मी आजपर्यंत म्हणत आलों नाहीं का ? मत आपल्या फायद्याचे आहे ह्मणून ते मत आजच ग्राह्य झाले काय ? वाईट तें सर्वत्र वाईटच ना ? आपल्यावर दुर्दैव ओढवले ह्मणून. वाईटाचे चांगले असें ह्मणावयाचे नाही ना ? मग अथीनियन लोकांच्या हुकुमाने मला येथे आणून ठेविले असतां त्यांच्या संमतीवांचून येथून जाणे रास्त होईल का ? एकाने अन्याय केला ह्मणून दुसऱ्याने त्याचप्रमाणे वागावे काय ? एकाने गाय मारली तर दुसऱ्याने वासरूं मारूं नये असे आजपर्यंत आपण शिकवीत आलो ते आतां धाब्यावर बसवावयाचे काय ? अथोनियन लोकांनी मला अन्यायाने शिक्षा केली ह्मणून आपण आपले ब्रीद सोडावे काय ? तेव्हां कोणत्याहि दृष्टीने विचार करतां माझे येथून निघून जाणे गैर होईल; असें तुह्माला दिसत नाही काय ? मला तर माझे असे वर्तन म्हणजे सर्व आयुष्यातील विचारांवर क्षणिक जीवाच्या आशेकरितां पाणी सोडण्यासारखे वाटत आहे ! कायदा पालन करणे हा एक सद्गुणाचा प्रमुख भाग आहे. त्याचे अशा करण्याने उल्लंघन होत नाही का ? मला तर या क्षणी माझ्यापुढे जणूं कांहीं अथेन्सचे कायदे व राज्यघटना ही मूर्तिमंत उभी असून ती माझी कानउघाडणी करीत आहेत असे वाटते. 'साक्रेटिस ! काय करावयाचे मनांत आणिलें आहे ? तुमच्या पळण्याच्या प्रयत्नाने तुह्मी आमचा गळाच दाबीत नाही काय ? कायदा व राज्यघटना यांखेरीज कोणता समाज सुरळित चालू शकेल ? जेथे कायद्याची पायमल्ली होते, जेथे खासगी व्यक्ति कायद्याला धाब्यावर बसवितात, जेथें न्यायाधिशांचा निकाल कोणी जुमानीत नाही, तेथे सुरक्षितपणे राहणे तरी शक्य आहे. काय ? साक्रेटीस ! तुम्ही म्हणाल, कायद्यांनी मला अन्यायाने वागविलें,<noinclude>{{center|२७}}</noinclude> o1p0if630x1cjjysrr10iewucb5tv5n पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३६ 104 110023 230215 230093 2026-05-20T08:53:35Z कल्पनाशक्ती 3813 230215 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>बाबतीचा विचार करूं नका ? तुम्ही अशा तऱ्हेनें वागलांत तरच तुह्माला स्वर्गातील न्यायाधीशापुढे उजळ माथ्याने उभे राहतां येईल व आपले संरक्षण योग्य प्रकारे करता येईल. हे अगदी उघड आहे की, तुमच्या पळपुट्या वर्तनाने तुमाला किंवा तुमच्या मित्रांना इहपरलोकीं मुळीच सुख होणार नाही, किंवा तुमचे आयुष्य उन्नत किंवा पवित्र होणार नाही. आतां तुही जर मेलांत तर लोक असें ह्मणतील की, अथीनियन लोकांनी साक्रेटिसास अन्यायाने शिक्षा दिली; परंतु तुमच्या विरुद्ध त्यांना चकार शब्दहि काढतां येणार नाही. परंतु जर तुम्ही अशा लज्जास्पद रीतीने अन्यायाची अन्यायाने फेड केलीत व वाईटाची वाईटाने फेड केलीत आमच्याशी केलेले करारमदार मोडलेत व ज्याच्या घाताचा विचार तुझी स्वप्नांतहि कधी आणूं नये त्या तुमच्या मित्रांचा, तुमच्या देशाचा व आमचा घात तुह्मीं केलात तर आह्मी तुमच्या जीवांत जीव आहे तो तुमच्यावर रुष्ट राहूं व तुह्मी मेल्यावर आमचे परलोकचे कायदेबंधु प्रेमाने तुमचे आदरातिथ्य करणार नाहीत. कारण, त्या कायद्यांना समजेल की, पृथ्वीवर असतांना तुम्ही आपल्या हातून होईल तितकी कायद्याची पायमल्लीच केलीत. तेव्हां तुम्ही आमचे म्हणणे ऐका. क्रिटोच्या मनधरणीकडे लक्ष देऊ नका !"
{{gap}}प्रिय क्रिटो ! हे कायद्यांचे शब्द माझ्या कानांत सारखे गुणगुणत आहेत असे मला वाटते व यामुळे मला दुसरें कांहीहि ऐकू येत नाहीं व म्हणूनच माझें मन वळविण्याचा तुमचा प्रयत्न अगदी व्यर्थ आहे ! तरी सुद्धां जर तुम्हाला आपला हेतु साध्य वाटत असेल तर तुम्ही आपला प्रयत्न चालू ठेवा."
{{gap}}यावर क्रिटो म्हणाला "साक्रेटीस ! आपल्या म्हणण्यापुढे माझ्याने कांहींहि बोलवत नाही, मी कुंठित झालो आहे."
{{gap}}साक्रेटीस म्हणाला "प्रिय क्रिटो ! तर मग आपण हा वाद थांबवूया व ईश्वर जशी आपणाला प्रेरणा करीत आहे त्याप्रमाणेच वागू या."
{{rule|5em}}{{nop}}<noinclude>{{center|३०}}</noinclude> r73huj1qbv7v4xtml93w41a1r7x7tdg पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३७ 104 110024 230216 230094 2026-05-20T08:55:43Z कल्पनाशक्ती 3813 230216 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" /></noinclude>{{center|(४)}} {{center|{{xx-larger|'''साक्रेटिसाचा मृत्यु.'''}}}} {{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}} {{gap}}'''"नास्ति जीवितादभिमततरं किमपीह जन्तूनाम् ”''' ही बाणभट्टाची उक्ति किती यथार्थ आहे! प्राणिमात्राला आपल्या जीवापेक्षा जास्त प्यारे काही नाही! मातेचे पुत्रावरील प्रेम अत्यंत निरपेक्ष व प्राणापलीकडील असते असे आपण म्हणतो. परंतु खरी स्थिति एका हरिदासी गोष्टींत वर्णिलेल्या वानरीच्या स्थितीप्रमाणे आहे, यांत शंका नाही. एकदां एक वानरी एका पुरांत सांपडली, तेव्हां ती आपले मूल पाठीवर वेऊन एका उंच ठिकाणी जाऊन बसली; परंतु तेथेहि पाणी आल्यावर ती आणखी उंच ठिकाणी गेली, पण पाणी तितक्या उंच चढले, तेव्हां वानरीचा निरुपाय होऊन ती दोन पायांवर उभी राहिली, आणि आपल्या मुलाला तिने डोकीवर घेतले परंतु पाणी भराभर चढतच चाललें, व तिच्या गळ्यापर्यंत येऊन तिचा जीव गुदमरूं लागला, तेव्हां तिने आपले डोकीवरचें मूल काढून आपल्या पायांखाली घातले, व त्यावर उभी राहून पाण्यापासून आपला बचाव करूं लागली, पण व्यर्थ! शेवटी त्या पुरांत वानरी व तिचे पिलूं या दोघांचाहि अंत झाला. तेव्हां सर्वांना आपल्या स्वप्राणापलीकडे प्रियतम काही नाही, हे खरे आहे, व हीच गोष्ट मनुष्यप्राण्यालाही लागू आहे. मनुष्याला जीवितासारखें दुसरें कांहीएक प्रिय नाही. '''"अंगं गलितं पलितं मुंडं, दशनविहीनं जातं तुंडम्"''' अशा जख्खड म्हाताऱ्यालासुद्धां जीवाची आशा सुटत नाही. एकाद्या इरसाल तिमाजी नाईकासारख्या चिक्कू माणसाला प्राणापेक्षां पैसा प्रिय आहेसा दिसतो; परंतु अशा तिमाजी नाईकापुढे जर यमराज खरोखरच दत्त म्हणून उभे ठाकले, तर त्याची<noinclude>{{center|३१}}</noinclude> 6h5g3ngx4x0x3wkps6c34po3cji8j9e पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३८ 104 110025 230217 230095 2026-05-20T08:59:13Z कल्पनाशक्ती 3813 230217 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>घाबरगुंडी वळून तो तिमाजी नाईक आपली सर्व संपत्ति यमराजाला देऊन टाकून जीव घेऊन धूम ठोकीत घराची वाट धरील, यांत शंका नाही. परंतु ज्याप्रमाणे प्राणिमात्राला समान असलेल्या षड्रिपूंवर आपली विवेकबुद्धि व मनोदेवता या दोन शक्तींच्या योगें मनुष्य विजय मिळवितो, त्याचप्रमाणे याच दोन शस्त्रांच्या सहाय्याने तो आपला अत्यंत प्रिय जीवहि आनंदाने सोडण्यास तयार होतो. खरी साधुवृत्ति अशा विजयातच आहे. व अशा साधुकोटी पैकीच साक्रेटिस होता, हे आतांपर्यंतच्या त्याच्या आयुष्यक्रमावरून आमच्या वाचकांना समजून आलेच आहे. आता या साधुपुरुषाचे मरणसमयीं वर्तन कसे होते हे त्याच्या आयुध्यांतील शेवटच्या दिवसाची साग्र हकीगत देऊन वाचकांना दर्शविण्याचा मानस आहे.
{{gap}}साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली होती, हे वाचकांना स्मरत आहेच. परंतु अथेन्सच्या नेहमीच्या चालीप्रमाणे त्या संस्थानचे गलबत त्याच संघींत धार्मिक सफरीवर गेले. व ते परत येईपर्यंत साक्रेटिसाची शिक्षा तहकूब राहिली होती. तें गलबत परत आल्यावर दुसऱ्याच दिवशी साक्रोटेसाची शिक्षा अमंलांत यावयाची होती. यामुळ ज्या दिवशी संस्थानचे गलबत परत आल्याची बातमी शहरांत पसरली, त्याच्या दुसऱ्या दिवशी अगदी उजाडत साक्रोटसाची शिष्य मडळी व मित्रमडळी आपल्या पूज्य गुरूचे व मित्राचे शेवटचे दर्शन घेण्याकरितां व त्याच्या शेवटच्या संभाषणाचे पान करण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर जमली. त्या दिवशी पहांटेलाच साक्रेटिसाच्या पायांतील बिड्या काढण्यांत आल्या होत्या. प्रथमतः साक्रेटिसाच्या बायकामुलांना आंत धाडण्यांत आले. साक्रेटिसाची बायकामुले फार रडू लागली, म्हणून साक्रेटिसाने लवकरच त्यांना परत लावून तो आपल्या आवडत्या शिष्यामित्र मंडळींत येऊन बसला, व आपल्या हाताने आपले पाय चोळीत चोळीत म्हणाला "मनुष्य ज्याला सुख म्हणतात, ती किती विचित्र वस्तु आहे! सुखाच्या उलट असलेले जे दुःख त्याच्याशी सुखाचा किती आश्चर्यकारक<noinclude>{{center|३२}}</noinclude> 6pss1l3hibgey14zdo2aifg903mrofd पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३९ 104 110026 230218 230096 2026-05-20T09:02:06Z कल्पनाशक्ती 3813 230218 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>संबंध आहे ! सुख व दुःख ही मनुष्याला एकदम मिळत नाहीत; परंतु सुखाचा पाठलाग करून ते माणसाने मिळविलें, की, त्याच्या मागोमाग दुःख आलेच म्हणून समजा ! जणूं काय सुखदुःख या दोन भिन्न वस्तूंची एका टोकाला गांठ बांधलेली आहे ! ही सुखदुःखांची सांगड जर ईसाबाने पाहिली असती, तर त्याने यावर एक अशी गोष्ट रचली असती, की, सुख-दुःखांचे भांडण होत असतां देवाने त्यांचा समेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे त्याला साधले नाही, तेव्हां त्याने त्यांची टोकें एके ठिकाणी बांधिली, व म्हणूनच मानव प्राण्याला एक मिळाले की, दुसरें त्याच्या पाठोपाठ मिळणारच म्हणून समजावे. पहा, माझी अशीच स्थिति झाली आहे. माझ्या पायांतल्या बिड्यांमुळे आतांपर्य मला दुःख होत होते, परंतु त्या बिड्या काढल्याबरोबर दुःखाच्या मागोमाग सुख आलेच !"
{{gap}}असे म्हणून साक्रेटिसाने आपल्या सभोवार जमलेल्या मित्रमंडळीकडे दृष्टि फेंकली. तेव्हां त्या मंडळींत अथेन्सशिवाय इतर शहारांतले परकी गृहस्थहि आले आहेत, असे त्याला आढळून आले व त्यांपैकी सीब्स या गृहस्थाने प्रथमतः बोलण्यास सुरवात केली. तो म्हणाला 'अहो साक्रेटिस ! तुम्ही तुरुंगांत असतांना अपोलो देवांची प्रार्थना कवितेत केली, व ईसाबाच्या गोष्टींना पद्यात्मक स्वरूप दिले याबद्दल दोन दिवसांपूर्वी ईव्हीनस हा कवि मजजवळ चौकशी करीत होता. तरी कृपा करून याचे कारण आपण सांगाल काय?"
{{gap}}सॉक्रेटिस उत्तरला, "सीब्स, त्यांना खरें तेच सांगा. त्यांना म्हणावें आपल्याशी किंवा आपल्या कवितांशी स्पर्धा करण्याच्या बुद्धीने मी कविता केल्या नाहीत. तसे करणे कांही सोपें काम नाही. परंतु नेहमीं नेहमी मला एक स्वप्न पडत असे, ते असे की, सॉक्रेटिस, काव्याचा अभ्यास करून काव्य रचा." या स्वप्नाचा मी नेहमी असा अर्थ घेत असे की. देव मला माझ्या अंगीकृत कामांत उत्तेजनच देत आहे. कारण मी आपले सर्व आयुष्य अध्यात्मविद्येत घालविले आहे व अध्यात्मविद्या हीच सर्वांत<noinclude>{{center|३३}}
{{gap}}सा...३</noinclude> 1raqzgndcovmcqk9eig20sfun8zbqgl पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४० 104 110027 230219 230097 2026-05-20T09:04:41Z कल्पनाशक्ती 3813 230219 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>उच्चतम कविता आहे, अशी माझी समजूत होती. परंतु मी तुरुंगांत पडल्यानंतर हे माझं स्वप्न मला लौकिक अर्थाने काव्य करण्यास तर सांगत नाही ना असे वाटू लागले आणि म्हणून आपल्या मरणापूर्वी या लौकिक अर्थाने कविता रचून मी स्वप्नांतली आज्ञा पाळण्याचा बेत केला. तदनुरूप मी देवाची एक प्रार्थना रचली व मग मला कल्पित गोष्टी रचतां येत नाहीत, म्हणून ईसाबाच्या ज्या काही गोष्टी मला आठवत होत्या, त्यांनाच पद्याचे स्वरूप देऊन मी आपल्या मनाचे समाधान केले. तेव्हां सीब्स, तुम्ही ईव्हीनस कवीला हे सर्व निवेदन करा. व माझा त्यांना नमस्कार सांगून माझ्या पाठोपाठ येण्याबद्दल त्यांना माझ्या तर्फे विनंति करा. कारण अथीनियन लोकांच्या इच्छेप्रमाणे मी आज प्रयाण करीन असे दिसते."
{{gap}}हे भाषण ऐकून सीमियस आश्चर्याने म्हणाला, "सॉक्रेटिस, ईव्हीनसला आपला कोण विलक्षण उपदेश हा! मी त्याला पुष्कळ वेळां भेटलो आहे व त्यांच्याबद्दल मला जी माहिती आहे, तीवरून मला असे वाटते की शक्य असेल तेथपर्यंत ईव्हीनस आपल्या उपदेशाप्रमाणे खात्रीने वागणार नाही!"
{{gap}}सॉक्रेटिसाने विचारले, "काय, ईव्हीनस हा तत्वज्ञानी नाही काय?"
{{gap}}सीमीयस उत्तरला,"होय, तो आहे असे मला वाटते."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, " तर मग ईव्हीनस मरणाची इच्छा करील व ज्याला ज्याला म्हणून तत्वज्ञानाच्या अभ्यासाची गोडी आहे, तो तो अशीच इच्छा करील. मात्र तो आत्महत्या करणार नाही. कारण असे करणे पाप आहे असे म्हणतात."
{{gap}}इतके बोलून सॉक्रेटिसाने आपले पाय खाटेवरून जामनीवर ठेवले. व राहिलेल्या सर्व संभाषणाच्या वेळी तो असाच बसून होता.
{{gap}}नंतर सीब्सने सॉक्रेटिसाला विचारले, "सॉक्रेटिस, आत्महत्या करणे वाईट, पण तत्वज्ञानी मरणाऱ्या माणसाच्या लागोपाठ जाण्यास इच्छा करील असे आपण म्हणतो, याचा अर्थ काय?{{nop}}<noinclude>{{center|३४}}</noinclude> 6azkfxtmskhbrhhuswpj3usz5lfnrgg पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४१ 104 110028 230220 230098 2026-05-20T09:07:37Z कल्पनाशक्ती 3813 230220 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, तुम्ही दोघेजणांनी फायलोलॉसजवळ जाऊन या गोष्टीबद्दल ऐकले नाही काय?"
{{gap}}"निश्चित असें कांही ऐकले नाही."
{{gap}}"बरें, मलाही सांगोसांगीच ठाऊक आहे. तरी पण मी जे ऐकलें आहे, ते तुम्हांला सांगावयाला काय हरकत आहे? खरोखरी जर मी परलोकाच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत आहे, तर त्या प्रवासाच्या स्वरूपाबद्दल व त्या प्रवासाबद्दल बोलणे रास्त नाही काय? आतांची वेळ व सूर्यास्त यांमधल्या काळाचा यापेक्षा जास्त चांगला सद्व्यय आपण काय करणार?"
{{gap}}"तर मग साक्रेटिस, आत्महत्या करणे वाईट असे ते कां म्हणतात? थीब्स शहरी असतांना असे करणे चांगले नाही, असें फायलोलॉस म्हणतांना मी ऐकले आहे, हे अगदी खरे आहे. दुसऱ्यांच्या तोंडूनही मी तेच ऐकले आहे, परंतु कोणाकडूनही मला निश्चयात्मक असें कांहीएक कळले नाही."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "तुम्ही धीर सोडतां कामा नये. कदाचित कधी काळी तुम्हांला काही तरी निश्चयात्मक कळेल. दुसऱ्या नियमांना अपवाद असतील, परंतु या नियमाला अपवाद नाही. तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, ते असे की, वाईट गोष्ट केव्हां केव्हां व कांहीं कांहीं माणसांच्या बाबतीत चांगली होते. परंतु मरणाला मात्र ही गोष्ट लागू नाही. ज्या माणसांनी मरणे बरे, त्यांनी देखील आपल्या हातांनी आपल्यावर मरण आणता कामा नये, त्यांनी त्याकरतां दुसऱ्याची वाट पहात राहिले पाहिजे."
{{gap}}हंसत हंसत व आपल्या प्रांतिक भाषेत सीब्स म्हणाला, "खरेंच."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "खरेंच. अशा तऱ्हेचे विधान तुम्हांला विचित्र वाटेल. तरी पण ते सयुक्तिक आहे. आणि या विधानाला एक सयुक्तिक कारणही दाखविता येईल. पण मनुष्यप्राणी हा एका प्रकारच्या तुरुंगांत आहे व तेथून त्याने आपली मुक्तता करून घेता कामा नये, अथवा तेथून<noinclude>{{center|३५}}</noinclude> iuf8691boyin8qg9sf9zvib1nh9o6l7 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४२ 104 110029 230207 230099 2026-05-20T08:21:19Z कल्पनाशक्ती 3813 230207 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="QueerEcofeminist" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>पळून जातां कामा नये. हें जें कारण गूढविद्या सांगते, तें बरेंच गहन असून समजण्यास सोपें नाहीं. तरी मला असें वाटतें कीं, देव हे मनुष्याचे पालक आहेत, व आपण मानव हे त्यांची मालमता आहों. तुम्हाला नाहीं का असे वाटत?"
{{gap}}" होय, मलाही असें वाटतें."
{{gap}}"तर मग तुम्ही तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली नसतांना तुमच्या एखाद्या अंकिताने आत्महत्या केली तर तुम्हांला राग नाहीं का येणार? आणि शक्य असल्यास तुम्ही त्याबद्दल त्याला शिक्षा नाहीं का करणार?"
{{gap}}"खात्री करूं."
{{gap}}तर आतां या विचारसरणीनें कोणत्याही माणसाला आत्महत्या करण्याचा हक्क नाहीं असें नाहीं का होत? प्रथम म्हटल्याप्रमाणें देवा कडून आग्रहाचें बोलावणें येईपर्यंत मनुष्याने वाट पाहिली पाहिजे. त्यानें आत्महत्या करतां नये"
{{gap}}सीव्स म्हणाला," होय. तुमचें म्हणणें स्वाभाविक दिसते. पण तुम्ही आतांच म्हणत होतां कीं तत्वज्ञानी मरणची इच्छा करील. मग देव पालनकर्ता आहे, व आपण त्याचे चाकर आहों, हें जर खरें, तर या दोन विधानांत विरोध येत नाहीं का? सर्व शासनकर्त्यांमध्यें श्रेष्ठ असे देव जर शहाण्यावर देखरेख ठेवतात, तर या अंमलापासून आपली सुटका करून घेण्याची इच्छा शहाणा करील असें म्हणणें युक्तीला पटत नाहीं. देव जितकी त्याची काळजी घेत आहेत, त्यापेक्षां जास्त काळजी आपण स्वतंत्र झाल्यावर आपली आपण घेऊं असें त्याला खास वाटणार नाहीं. कदाचित् मूर्खाला असे वाटेल व आपल्या धन्यापासून पळून गेल्यास बरें, असें तो म्हणेल. इतक्या चांगल्या धन्याला आपण सोडून जाऊं नये, तर शक्य तितका काळ त्याच्याजवळच रहावें, असें त्याच्या मनांत येणार नाहीं, व म्हणून अविचाराच्या भरांत तो पळून जाईल. परंतु आपल्यापेक्षां सर्व तऱ्हेनें श्रेष्ठ असणाऱ्या धन्याजवळ नेहमी राहण्याची<noinclude>{{center|३६}}</noinclude> fleyeacroaa3u3wmwvw81qjuk6q17tp पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४३ 104 110030 230208 229442 2026-05-20T08:29:27Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230208 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>इच्छा शहाणा करील, यांत शंका नाहीं. पण ही विचारसरणी जर खरी आहे तर आतां आपण म्हणतां त्याच्या उलटच अनुमान निघतें. शहाण्या माणसाला मरणाबद्दल वाईट वाटले पाहिजे, व मूर्खाला आनंद वाटला पाहिजे.
{{gap}}या सीब्सच्या म्हणण्यानें सॉक्रेटिसाला आनंद झाल्यासारखा दिसला. त्याने आमच्याकडे पाहिले व म्हटले, "सीब्स, हा नेहमी प्रमाणांची छाननी करतो. त्याला निव्वळ दुसऱ्याच्या विधानानें कधींच समाधान होत नाहीं."
{{gap}}सीमीथस म्हणाला, "होय, सॉक्रेटीस, पण सीब्स म्हणतो, त्यांत कांहीं तरी तथ्य आहे, असे मलाही वाटतें. खऱ्याखुऱ्या शहाण्या माणसांनी आपल्यापेक्षां चांगल्या धन्यापासून पळून जाण्याची व त्याची चाकरी चटकन् सोडण्याची कां इच्छा करावी? मला वाटतें कीं, सीब्सच्या म्हणण्याचा सर्व रोख तुमच्याकडे आहे. कारण आपल्याच म्हणण्याप्रमाणे जे देव इतके चांगले धनी आहेत, त्यांना व आम्हांला तुम्ही सोडून जाण्याला इतके उत्सुक झालां आहां."
{{gap}}सॉक्रेटीस म्हणाला, "तुमचें म्हणणे रास्त आहे. मी न्यायाच्या कोर्टात असल्याप्रमाणे तुमच्या आरोपाचे खंडन केलें पाहिजे, असें तुमचें म्हणणें."
{{gap}}सीमीयस म्हणाला, "होय. हाच आमचा आशय आहे."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "बरें तर माझ्या खटल्याच्या चौकशीच्या वेळीं माझ्या हातून माझ्यावरील आरोपाचे निरसन न्यायाधिशांना पटेल अशा तऱ्हेनें झालें नाहीं. आतां तरी ते तुम्हांला पटण्यासारखे होवो, म्हणजे झाले. सीब्स व सीमीयस, चांगल्या व शहाण्या देवांच्या सहवासांत व या मर्त्यलोकांच्यापेक्षां चांगल्या लोकांच्या सहवासांत माझ्या मरणानंतर मला रहावयाला सांपडेल, अशी जर माझी समजूत नसती तर मला मरणाबद्दल खरोखरी वाईट वाटले असते. पण मी चांगल्या लोकांच्या सहवासांत राहणार अशी मला आशा आहे. अशा अतींद्रिय गोष्टीबद्दल जितकी<noinclude>{{center|३७}}</noinclude> 32uespkctsjmcqhu7tf8gvd1f21xtzv पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४४ 104 110031 230221 229485 2026-05-20T09:13:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230221 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>खात्री असणें शक्य आहे, तितकी माझी खात्री आहे. मी चांगल्या धन्यांजवळ जाणार आहे. व म्हणूनच मला मरणाबद्दल दुःख होत नाहीं. माझा असा दृढ समज आहे कीं, मेलेल्यांना पुढे कांहीं एका प्रकारचें आयुष्य आहे व तें आयुष्य दुष्टापेक्षां सद्गुणी माणसांना जास्त सुखावह असते.”
{{gap}}सीमीयस म्हणाला, "बरें, पण आपण हा आपला समज आपल्याजवळच ठेवून जाणार कीं, आम्हांलाही त्याचा फायदा देणार? असें दिसतें कीं, या समजांत आमचाही हितसंबंध आहे. शिवाय जर तुम्ही आमची आपल्या म्हणण्याबद्दल खात्री केली तर तुमच्या वर्तनाचें तुम्ही समर्थन केल्यासारखं होईल. "
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "मी प्रयत्न करून पाहतों, पण क्रिटो माझ्याजवळ बोलायला पाहतो आहे असें मला वाटतें. तर प्रथमतः त्याचें म्हणणें ऐकूं या."
{{gap}}क्रिटो म्हणाला, "सॉक्रेटिस, मला फक्त हेंच सांगावयाचें आहे कीं तुम्हाला विष देण्याचे काम ज्या माणसाचं आहे त्याने मला तुम्हाला असें बजवायला सांगितलें आहे की आपण फार बोलू नका. कारण बोलण्यानें मनुष्याचें रक्त तापते व मग विषाचा परिणाम उष्णतेने कमजोर होतो. जे लोक आपले रक्त तापवून घेतात, त्यांना केव्हां केव्हां २ किंवा ३ वेळां सुद्धां विषप्राशन करावें लागतें."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "बरें तर मग. त्याला आपल्या कामाला लागू दे व दोनदां किंवा गरज लागल्यास तीनदां मला विष देण्याची त्याची तयारी असूं दे, म्हणजे झाले."
{{gap}}क्रिटो म्हणाला, तुम्ही हेंच उत्तर द्याल, हे मला ठाऊक होते. परंतु त्या माणसाचा फार आग्रह होता."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "त्याच्या म्हणण्याकडे लक्ष्य देण्याचे कारण नाहीं. पण आपण आपल्या वादविषयाकडे वळू.”
{{gap}}इतकें प्रस्तावनारूप संभाषण झाल्यावर सॉक्रेटिसाने प्रथमतः तत्वज्ञान ही एक प्रकारची मरणमीमांसा कशी आहे, हें सिद्ध केलें व नंतर आत्मा<noinclude>{{center|३८}}</noinclude> lzk7zvp47tkxcrk69axxgxyllhm3msx पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४५ 104 110032 230222 229492 2026-05-20T09:15:35Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230222 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''सांक्रेटिस.'''}}</noinclude>अमर आहे, हा आपला समज कसा खरा आहे, याबद्दल विवेचन केलें. सीब्स व सोमीयस यांनीं शक्य तितके आक्षेप घेतले, परंतु या सर्व आक्षेपांचें साक्रेटिसानें खंडन केलें व आपले म्हणणें प्रमाणांनीं सिद्ध केलें. परंतु हा सर्व वादविवाद व त्यांतील प्रमाणें ह्रीं सॉक्रेटिसाची नसून त्या प्रमाणांमध्ये प्लेटोचे सर्व तत्वज्ञान व त्याची विशेष मतें यांवरच भिस्त ठेवली असल्यामुळे हा भाग बराच गहन व कांहींसा रुक्ष आहे व तो माझ्या वाचकांना कंटाळवाणा वाटण्याचा फार संभव आहे, म्हणून त्या वादविवादाचा अनुवाद येथे देत नाहीं. शिवाय सॉक्रेटिसाच्या चरित्राच्या दृष्टीने त्याचा कांहीं उपयोग नाहीं. पण हा आत्म्याचा वाद सॉक्रेटिस बहुतेक सर्व दिवसभर करीत होता. वादाच्या शेवटी सॉक्रेटिसानें मरणानंतर आत्मा आपापल्या पापपुण्याप्रमाणे निरनिराळ्या लोकीं कसा जातो, व तेथें त्याला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांबद्दलचं योग्य बक्षीस किंवा शिक्षा कशी होते याबद्दलची आख्यायिका सांगितली. ही गोष्ट अतींद्रिय असल्यामुळे प्रमाणांनी सिद्ध करतां येण्यासारखी नाहीं, असेंही त्यानें कबूल केले व नंतर तो म्हणाला, "मी वर्णन केल्याप्रमाणे हुबेहूब स्थिति आहेच, असें समंजस मनुष्य आग्रहाने सांगणार नाहीं. पण आत्मा व त्याचा पुढील निवास यांसंबंधी असे कांहीं तरी असावें, असें मला वाटते. कारण आत्मा अमर आहे, एवढे आपण सिद्ध केलं आहे. तेव्हां पुढील वर्णनावर भरवसा ठेवणं बरें, व मनांत शंका आल्यास त्या असल्या गोष्टीच्या मंत्रांनी मनांतून घालवून लावणें रास्त. म्हणूनच जर मनुष्यानें शरीर व विषयमुख यांची पर्वा न करतां विद्याधन व सद्गुणघन मिळविण्यांत आपला वेळ खर्च केला असेल, तर त्याने आपल्या आत्म्याबद्दल काळजी न करतां आनंदाने मरणाला राजी असले पाहिजे. सीब्स सीमीयस व माझ्या इतर स्नेह्यांनो! तुम्ही सर्व आपापल्या योग्य वेळीं या प्रवासावर निघाल. पण कविवचनाप्रमाणे देवाने मला आतां बोलाविलें आहे, तेव्हां मी स्नान करून तयार व्हावे, हें बरें. कारण, विष<noinclude>{{center|३९}}</noinclude> nyv4x1o8vtigetl0fjbsg9hwqoknel0 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४६ 104 110033 230223 229540 2026-05-20T09:17:43Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230223 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>घेण्याच्या आधीच स्नान केलेले असले म्हणजे प्रेताला स्नान घालण्याचा त्रास बायकामाणसांना पडणार नाही."
{{gap}}सॉक्रेटिसाचे बोलणे संपल्यावर क्रिटोनें उत्तर दिले, "आपली इच्छा ठीक आहे. पण तुमच्या मित्रांना किंवा मला आपल्या मुलांबद्दल किंवा दुसऱ्या गोष्टींबद्दल काही सांगावयाचे आहे काय? शेवटी आपल्याकरतां आम्ही काय करावे?"
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "क्रिटो, मी आजपर्यंत जो तुम्हांला उपदेश करीत आलों, त्याप्रमाणे तुम्ही वागलांत, म्हणजे मला सर्व काही मिळाले. तुम्ही आपल्या आत्म्याची योग्य काळजी घ्या, म्हणजे माझी, माझ्या मुलांबाळांची व तुमची स्वतःचीही योग्य सेवा केल्यासारखे होईल. मग तुम्ही आतां मला वचन दिले नाही, तरी हरकत नाही. परंतु जर तुम्ही आपल्या आत्म्या बद्दल बेपर्वा राहिलां, आणि आज व दुसऱ्याही प्रसंगी वादविवादांत ज्या तऱ्हेच्या आयुष्यक्रमाचे चित्र आपण रेखाटले आहे, त्याप्रमाणे वागला नाही, तर तुम्ही आज दिलेली वचने कितीही लांबलांब आणि मनोभावाने दिलेली असोत, त्यांचा काहीएक उपयोग नाही."
{{gap}}क्रिटो म्हणाला, "आपल्या उपदेशाप्रमाणे वागण्याचा आम्ही होईल तितका प्रयत्न करूं. परंतु तुम्हांला आम्ही कोणत्या तऱ्हेने पुरावे?"
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "तुमच्या इच्छेनुरूप फक्त प्रथमतः मला तुमच्यापासून दूर जाऊ न देतां धरून ठेवले पाहिजे."
{{gap}}नंतर सॉक्रेटिसाने हंसतमुख होऊन आपल्या मित्रमंडळीकडे पाहून म्हटले, "मित्रहो! तुमच्याजवळ बोलणारा व आपली प्रमाणे व्यवस्थेने मांडणारा तो मी सॉक्रेटिस, ही गोष्ट क्रिटोला काही पटलेली दिसत नाही. त्याला वाटते की, लवकरच प्रेत होऊन पडणारे जे माझें शरीर, तोच मी, व म्हणूनच मला कसे पुरावयाचे याबद्दल तो विचारपूस करीत आहे. विष प्राशन केल्यावर मी येथे राहणार नाही, तर भल्या लोकांच्या वस्तीला जाईन, हे सिद्ध करण्याकरतां मी जी प्रमाणे उपयोगांत आणली व ज्या प्रमाणांच्या योगाने तुमचे व माझे समाधान झालें, ती सर्व प्रमाणे क्रिटो-<noinclude>{{center|४०}}</noinclude> k5dbot38n0loiaqj9a9z967wm3p278f पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४७ 104 110034 230224 229487 2026-05-20T09:19:53Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230224 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>च्या मनावर उपड्या घागरीवर पाण्यासारखी झाली! तरी तो ज्याप्रमाणे चौकशीच्या वेळी मला जामीन राहिला होता, त्याप्रमाणे आतां तुम्ही मला निराळ्या तऱ्हेनें जामीन रहा. तेव्हां मी येथून जाणार नाही, हजर राहीन, अशाबद्दल त्याने हमी घेतली होती, परंतु आतां माझ्या मरणानंतर मी तुमच्याबरोबर राहणार नाही, तर येथून जाईन, अशाबद्दल तुम्ही हमी घ्या. असे तुम्ही केले म्हणजे माझ्या मरणाबद्दल त्याला कमी दुःख होईल, व जेव्हां माझें शरीर जळतांना किंवा पुरतांना तो पाहील, तेव्हां मला भयंकर यातना होत आहेत, असे त्याला वाटणार नाही. तसेच माझ्या स्मशानाविधीच्या वेळी सॉक्रेटिसाला कपडे चढवून नीट बसवीत आहों, किंवा सॉक्रेटिसाला जाळीत किंवा पुरीत आहों, असें तो म्हणणार नाही. कारण प्रिय क्रिटो! तुम्ही हे ध्यानात ठेवा की, अयथार्थ शब्दप्रयोग करणे हा मूळ दोष आहे इतकेच नव्हे तर त्याच्या योगाने आत्म्यालाही दोष लागतो. म्हणून तुम्ही आनंदी राहून माझें शरीर पुरावयाचे असा शब्दप्रयोग करा व तें माझें शरीर तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे व तुम्हाला योग्य दिसेल त्या तऱ्हेने पुरा."
{{gap}}इतके बोलून सॉक्रेटिस उठला व स्नान करण्याकरतां दुसऱ्या खोलीत गेला. क्रिटो त्याच्या मागोमाग गेला व बाकीची मंडळी मागे राहिली. सर्वजण सॉक्रेटिसाच्या वादविषयावर बोलत होते व आपल्यावर केवढे संकट आले आहे, आज जणूं काय आपला पिताच मरत आहे व पुढील सर्व आयुष्यभर आपण पोरके होणार असे त्यांच्या मनांत येत होते.
{{gap}}इतक्यांत सॉक्रेटिसाची आंघोळ आटपली आणि त्याच्या कुटुंबाची मंडळीची-त्याला दोन अगदी लहान व एक जाणता मुलगा होता- भेट झाली. क्रिटोच्या समक्षच तो बायकामुलांजवळ बोलला. व आपली शेवटली आज्ञा त्यांना सांगून त्याने त्या सर्वांना घरी लावून दिले आणि मग तो आपल्या मित्रमंडळीकडे वळला. या वेळी सूर्य अस्ताला जाऊ लागला होता. कारण तो आंतल्या खोलीत बराळ वेळ होता. स्नान होऊन मित्रमंडळींत बसल्यानंतर फारसे बोलणें निघाले नाही.{{nop}}<noinclude>{{center|४१}}</noinclude> mnqut21b2l7mlk77lgpf26or75a1pxo पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४८ 104 110035 230225 229541 2026-05-20T09:22:01Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230225 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>{{gap}}थोड्याच वेळांत सरकारी माणूस येऊन सॉक्रेटिसला म्हणाला, "सॉक्रेटिस, इतर माणसांप्रमाणे तुम्ही असमंजसपणाने वागणार नाही, हें मला ठाऊक आहे. सरकारी हुकमाप्रमाणे विष प्यायला मी त्यांना सांगितले, की ते माझ्यावर रागावतात व मला शिव्याशाप देतात. परंतु आजपर्यंत जे जे लोक तुरुंगांत आलेले आहेत, त्या सर्वांत तुमच्यासारखा उदार, शांत व उत्कृष्ट मनुष्य मला तर आढळला नाहीं! आणि आतां माझी खात्री आहे, की तुम्ही माझ्यावर रागावणार नाही, तर ज्यांच्या शिरावर आपल्या मृत्यूचे खापर फुटले आहे, त्यांच्यावर रागवाल, ज्याला उपाय नाही ती गोष्ट आपण शांतपणे सोसण्याचा प्रयत्न करा. मी कां आलो आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच, आतां मी आपला निरोप घेतो."
{{gap}}सॉक्रेटिसाने त्या माणसाकडे पाहून त्याला म्हटले, "ठीक आहे, तुम्ही म्हणतां त्याप्रमाणे वागण्यास मी तयार आहे."
{{gap}}नंतर मित्रमंडळीकडे वळून तो म्हणाला, "हा मनुष्य किती सभ्य आहे! माझ्या सर्व तुरुंगवासांत हा मनुष्य मजकडे नेहमी येत असे. हा केव्हां केव्हां माझ्याजवळ बोले व माझ्याशी फार चांगल्या तऱ्हेनें वागे. आता माझ्याकरता त्याला किती दुःख होत आहे? क्रिटो, चला तर आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करूं या, विष तयार झाले असले तर आणवा व जर ते तयार झाले नसले तर तयार करवा."
{{gap}}क्रिटो म्हणाला, "नाही. सॉक्रेटिस, अजून सूर्य टेकड्यांवरच आहे. तो मावळला नाही. शिवाय मला ठाऊक आहे की, इतर माणसें अगदी उशीरां विष प्राशन करतात व विष घेण्याबद्दल इशारा झाल्यावर सुद्धां हौसेने खातात, पितात व आपल्या निवडक मित्रांचे सहवाससुख भोगतात, तेव्हां घाई करण्याचे कारण नाही. अजून वेळ आहे."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "क्रिटो, ज्यांच्याबद्दल तूं बोलत आहेस ते साहजिकच तसे करतात, कारण असे करण्यापासून आपला फायदा आहे असे त्यांना वाटते. पण मी मात्र तसे करणार नाही. कां की थोड्या उशीराने विष पिण्यापासून मला काही एक मिळणार नाही. उलट जे<noinclude>{{center|४२}}</noinclude> lw28rxpmi5qxym8gd7e17o4ex77ae9z पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४९ 104 110036 230226 229496 2026-05-20T09:23:55Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230226 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>आयुष्य बहुतेक संपत आले आहे, त्या आयुष्याचा अधाशीपणाने संग्रह करण्याबद्दल मी आपल्याला तुच्छ मानूं लागेन. म्हणून मी म्हणतो, त्याप्रमाणे करण्याचे नाकारूं नका."
{{gap}}तेव्हां जवळ असलेल्या आपल्या गुलामाला क्रिटोनें खूण केली. तो गुलाम बाहेर गेला व थोड्या अवकाशाने तयार केलेल्या विषाचा पेला हातांत घेतलेल्या माणसासह तो परत आला.
{{gap}}त्या माणसाला पाहून सॉक्रेटिस त्याला म्हणाला, "मला काय करावयाचे याची तुला सर्व माहिती आहे?"
{{gap}}त्याने उत्तर दिले, "फक्त हे तुम्ही प्राशन करा, व पाय जड होईपर्यंत इकडे तिकडे हिंडा व मग पडून रहा. म्हणजे विषाचा आपोआप परिणाम होऊ लागेल."
{{gap}}असे म्हणून त्या माणसाने तो पेला सॉक्रेटिसाला दिला, व चेहेऱ्यात किंवा आकृतीत यत्किंचितही फरक न होऊ देतां व न कापतां मोठ्या आनंदाने सॉक्रेटिसाने तो घेतला.
{{gap}}आपल्या नेहमींच्या स्थिर नजरेने त्या माणसाकडे पाहून सॉक्रेटिसाने त्याला विचारले, "या पेल्यांतून देवाचें तर्पण करण्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे? मी करूं की नको?"
{{gap}}तो मनुष्य म्हणाला, "आम्ही एका माणसाला पुरेल इतकेंच विष तयार करतो."
{{gap}}सॉक्रेटिस म्हणाला, "मी समजलों; पण मला तर्पण करावयाला हरकत नाही, व देवाची प्रार्थना मला केलीच पाहिजे. म्हणजे माझा येथपासूनचा प्रवास सुखाचा होईल. हीच माझी प्रार्थना, तरी त्याप्रमाणे घडो."
{{gap}}इतके बोलून साक्रेटिसाने तो पेला तोंडाला लावला व त्यांतील विष त्याने अगदी शांतपणाने व आनंदाने पिऊन टाकले, हे होईपयेंत सॉक्रेटिसाच्या स्नेहीमंडळीने आपले दुःख बरेच आवरून धरले होते; परंतु त्याला विष पितांना व तें संपवून टाकतांना त्यांनी पाहिले, तेव्हां त्यांचे<noinclude>{{center|४३}}</noinclude> 77duq6r4a3asmpro8pajat4pgnn1bza पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५० 104 110037 230227 229542 2026-05-20T09:25:48Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230227 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>दुःख आवरेना; सर्वांना ओक्साबोक्शी रडू कोसळले. सॉक्रेटिसाकरितां ती मंडळी रडत नव्हती, तर आपला इतका उत्तम मित्र नाहीसा झाला याबद्दल ती रडत होती. क्रिटोला तर आपले अश्रु न आवरल्यामुळे तो बाहेर गेला होता, व त्या सर्व दिवसभर ज्याच्या रडण्याला खळ पडला नव्हता, तो अपॉलोडोरसहि मोठमोठ्याने रडू लागला, व त्याच्या हुंदक्यांनी आणि विलापांनी सर्वांच्या काळजाचे पाणी झाले. मात्र सॉक्रेटिस अगदी शांत होता. तो सर्वांना म्हणाला, "मित्रहो, तुम्ही हे काय मांडिले आहे? अशा तऱ्हेचे प्रदर्शन होऊ नये, म्हणून मी बायकांमुलानां मुद्दाम पाठवून दिले. कारण मी असे ऐकिले आहे की, मनुष्याला शांततेने मरण यावे, म्हणून तुम्ही शांत व्हा व धीर धरा."
{{gap}}हे सॉक्रेटिसाचे भाषण ऐकून सर्व मंडळी लाजली, व त्यांनी आपला शोक आवरला. इकडे सॉक्रेटिस येरझारा घालीत होता; इतक्यांत आपले पाय जड होत आहेत, असे त्याला भासले, व मग त्याला सांगितल्याप्रमाणे तो उताणा निजला. नंतर विष देणारा माणूस राहून राहून त्याचे हातपाय तपासू लागला, व पायांला जोराने दाबून येथे संवेदना होतात का म्हणून विचारूं लागला. सॉक्रेटिस म्हणाला, "नाही होत." नंतर त्याने त्याच्या तंगड्या त्याच प्रमाणे दाबल्या, व सॉक्रेटिसाचे शरीर गार व ताठ होत चालले आहे हे सर्वांना दाखविलें, सॉक्रेटिसानेंहि ते पाहिले व "हृदयापर्यंत पोहोचले, म्हणजे मी जाईन," असे म्हटले. त्याच्या कमरेपर्यंत गारवा आला, तेव्हां साक्रेटिसाने आपल्या चेहऱ्यावरील आवरण काढून टाकलें, व पुढील शब्द उच्चारले. ते त्याचे शेवटचेच होते.
{{gap}}"क्रिटो, अस्क्लेयस देवाला मी एक कोंबडे द्यावयाचे राहिले आहे ते द्यायला तूं विसरूं नकोस."
{{gap}}क्रिटो म्हणाला, "मी खात्रीने देईन. आपली आणखी काही इच्छा आहे काय?"
{{gap}}या प्रश्नाला सॉक्रेटिसाने उत्तर दिले नाही. पण थोड्याच वेळाने<noinclude>{{center|४४}}</noinclude> 7nuwxxppym8g6wpe2lcunybj8k9pus9 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५१ 104 110038 230228 229544 2026-05-20T09:26:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230228 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /> {{right|'''साक्रेटिस.'''}}</noinclude>थोडी हालचाल झाली व त्या माणसानें सॉक्रेटिसाला उघडें केलें,तों त्याचे डोळे थिजले होते. नंतर क्रिटोनें त्याचें तोंड व डोळे मिटले.
{{gap}}याप्रमाणे त्या अद्वितीय शहाण्या, निस्पृही व सर्वोत्कृष्ट साधूला मरण आलें. {{nop}}<noinclude>{{center|४९}}</noinclude> j5kbfl9v9gonocjt2itx9aiwi3ymmd5 सदस्य चर्चा:Sakshi Nalawade 3 110376 230205 2026-05-19T12:42:42Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 230205 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Sakshi Nalawade}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १८:१२, १९ मे २०२६ (IST) iika8hw4ie0xf4ap5v72euqhj4vl4q3