विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.3 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:तीन तत्त्वज्ञानी.pdf 106 68408 230240 229897 2026-05-20T12:58:44Z कल्पनाशक्ती 3813 230240 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=तीन तत्त्वज्ञानी |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=केशव रावजी गोंधळेकर |Address=पुणे |Year=1921 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 3="प्रस्तावना" 6 ="अनुक्रमणिका" 7="साक्रेटिस" 63="जॉर्ज बार्क्ले"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 3141av5qmudk3qp529n2xy60jqarys4 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५२ 104 110039 230229 229547 2026-05-20T12:32:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230229 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|(५)}} {{center|{{X-larger|'''फलश्रुति.'''}}}} {{rule|5em}} {{gap}}कोणतीही कथा अथवा पुराण पुरें झालें म्हणजे शेवटीं त्याची फलश्रुती सांगण्याची रीति पुरातनच आहे. तदनुरूप साक्रेटिसाच्या कथेचा विषप्राशनाचा लेख लिहून झाल्यावर मी त्या कथेची फलश्रुती सांगण्याचा विचार मनांत आणिला, आणि हातांत लेख लिहिण्याकरितां लेखणी घेतली. पण, आतां फलश्रुति काय सांगावयाची, हें सुचेना. नेहमींच्या पुराणपद्धतीप्रमाणे "जो कोणी हें पुराण श्रवण करील, पठण करील किंवा मनन करील, तो निपुत्रिक असल्यास पुत्रवान् होईल, निर्धन असल्यास धनसंपन्न होईल, पुत्रपौत्रादिकांसह तो इहलोकीं मान्य होईल, व सर्व पापांपासून मुक्त होऊन देहत्यागानंतर परलोकीहि पूज्य होईल," अशी अंधश्रद्धात्मक फलश्रुति, ज्याचें आयुष्य अंधश्रद्धेचा नायनाट करण्यांत गेले, त्या पुरुषाच्या चरित्राची सांगणे म्हणजे विपरीतच होय, असे वाटलें. बरें इसाबनीतीच्या गोष्टीच्या शेवटीं तात्पर्य सांगतात, त्याप्रमाणे 'मरतांना आनंदानें हा लोक सोडावा,' इतकीच फलश्रुति सांगून स्वस्थ बसावें तर तसे करणें बरें वाटेना. साक्रेटिसाच्या उपदेशाचा सारांश देऊन त्याचा अनुवाद करावा तोहि मार्ग स्वशक्तीच्या बाहेरचा वाटला. याप्रमाणें काय नाहीं, अशा मनाच्या परिस्थितीत माझा डोळा लागला, व मला असे स्वप्न पडलें कीं, मी कोठे तरी अंतरिक्षांत वरवर जात आहे. वर जातांना मला निरनिराळे अंतरिक्षांतील लोक लागले, आणि शेवटीं मी एका लोकीं येऊन थडकलों; तेथे पाहूं लागलों, तों निरनिराळ्या थोर पुरुषांच्या आकृति दिसूं लागल्या. त्या आकृतींत एक आकृती मोठमोठ्यानें<noinclude>{{center|४६}}</noinclude> psdsz1adk21b3sdlj1igesrf36v1s79 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५३ 104 110040 230230 229551 2026-05-20T12:34:09Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230230 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''साक्रेटिस.'''</u>}}</noinclude>पण आपल्याशींच बोलत आहे, असें मला दिसले; म्हणून मी तिकडे वळलों, तो ती आकृति मी वाचलेल्या साक्रेटिसाच्या वर्णनाशी हुबेहुब जुळली. हें पाहतांच माझा आनंद गगनात मावेना. कारण, माझी काळजी दूर झाली, असे मला वाटले, व मी भराभर त्या आकृतीच्या तोंडून निघालेले उद्गार टिपून घेऊं लागलों. इतकें मला स्वप्न पडलें. सकाळी उठून पाहतों, तो माझ्या टेबलावर एक वही पडलेली. ती उघडून पाहतांच तींत तें साक्रेटिसाचें आत्मगत भाषण लिहून ठेवलेले दिसले. तरी आतां अधिक प्रस्तावना, किंवा हे कसें झालें, याची चर्चा न करितां या भाषणाचा समग्र उतारा फलश्रुतीदाखल देतों.<br>{{gap}}"केवढा प्रचंड समाज हा! माझ्या प्रिय देशबांधवांच्या आर्यशाखेतीलच हे हिंदुलोक आहेत. पण हा एवढा मोठा हिंदुसमाज अगदीं सामसूम कां बरें दिसत आहे? अरेरे! या तीस कोटि लोकांपैकी शेकडा नव्वद लोक पूर्ण अज्ञानी आहेत. ज्ञान हें तर मानवप्राण्याचे खरें जीवन आहे; तेंच जर या इतक्या लोकांत नाहीं, तर यांच्यामध्ये जागृति कशी दिसावी व येथे हालचाल तरी कशी दृग्गोचर व्हावी?{{gap}}"माझ्या प्रिय ग्रीसदेशांत पुष्कळ गुलाम होते. येथें गुलाम नाहींत खरे, तरी पण येथे सात कोटि अस्पृश्य लोकांचा वर्ग आहे. या लोकांची काय ही हीन स्थिति! आमच्या वेळचे गुलाम घरांतलीं सर्व कामें करीत. त्यांना आम्ही शेताची कामे सांगत असूं. गुलाम आमच्या मुलांबाळांचे संगोपन करीत असत. ते आमच्यांत मिळतमिसळत असत. त्यांना फक्त राजकीय हक्क नव्हते. पण येथल्या अस्पृश्य जातीची स्थिति गुलामापेक्षांहि वाईट दिसते. अरेरे! यांना वरच्या जाति पशुपेक्षांहि कमी लेखतात. कारण, ते या वर्गाची सावलीसुद्धां अपवित्र मानतात. हरहर! ज्या देशांतील तत्त्वज्ञांनी 'वसुधैव कुटुंबकम्' किंवा 'सर्वांभूतीं परमेश्वर' अशासारखी उदात्त तत्त्वें प्रतिपादन केली, त्याच देशांतील वरिष्ठ जातींनीं सांप्रत आपल्याच सारख्या चालत्या बोलल्या, आपल्याच सारख्या बुद्धिवान् आपल्याचसारख्या विचारवंत व आपल्याच-<noinclude>{{center|४७}}</noinclude> q1418u18wgmbddvxqkfz5tuuc8labj0 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५४ 104 110041 230231 229553 2026-05-20T12:36:44Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230231 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>सारख्या मनोवृति असलेल्या ईश्वराच्या लेकरांना अस्पृश्य समजावें, व त्यांच्या वाऱ्यालाहि उभं राहूं नये, व या अस्पृश्य जातीच्या माणसांच्या स्वतःच्या मनाची इतकी अवनति व्हावी, कीं, अशा वागणुकीचा त्यांना त्वेष येऊ नये; आपल्यांतील मनुष्यांश व पर्यायाने ईश्वरांश यांची पूर्ण विस्मृति व्हावी, हें केवढे अगाध अज्ञान व त्याचाच परिणाम ही केवढी अंधश्रद्धा! माझ्या ग्रीसदेशांत मी आपल्या लोकांचे दोन दोष पाहिले होते. एक अंधश्रद्धा व दुसरी कर्तव्यशून्यता. हे दोन्हीहि दोष एकाच अज्ञानरूप कारणानें उत्पन्न होतात, व म्हणून मी आजन्म सत्यज्ञानाचा प्रसार करण्याकरितां खटपट केली. या समाजांतहि हे दोष दिसून येत आहेत, परंतु सुधारलेल्या राज्यपद्धतीनें येथें ज्ञानाचा प्रसार कांहीं कांहीं लोकांत होऊं लागला आहे. तरी आतां या सुशिक्षित वर्गाच्या मनःस्थितीचे निरीक्षण करूं या.<br> {{gap}}"या सुशिक्षित वर्गामध्यें धंद्याप्रमाणे निरनिराळे वर्ग झालेले आहेत. याच श्रमविभागाच्या तत्वावर व जितजेते या संबंधापासून या एकजीव आर्यलोकांमध्ये प्रथमतः वर्णभेद उत्पन्न झाला. परंतु, जोंपर्यंत हें वर्गीकरण श्रमविभागावरच होतें, तोंपर्यंत त्यांमध्यें पुष्कळ लवचिकपणा होता. परंतु पुढे पुढे हे वर्गीकरण जन्मावरून ठरूं लागलें, व वर्ण परमेश्वरानेंच निर्माण केले आहेत, अशी समजूत फैलावली आणि तेव्हांपासून जातिभेद जोरानें सुरू झाला, व त्याला तीव्र स्वरूप प्राप्त झालें. हल्लीं या समाजांत हजारों जाति झाल्या आहेत, व सुशिक्षित लोकहि अंधश्रद्धेनें या चालीला चिकटून राहिले आहेत, ही केवढी शोचनीय गोष्ट आहे! पण हल्लीं धंद्यामुळे नवे झालेले वर्ग किंवा जाति- हिंदुलोकांना परिचित असा शब्द वापरल्यानें त्यांची होणारी चूक त्यांच्या ध्यानांत येईल, म्हणून तोच शब्द वापरू या- इंग्रजी शिकणाऱ्या लोकांमध्येहि दिसून येत आहेत.<Br>{{gap}}पहिली मोठी जात सरकारी नोकरांची. यांत लहान मोठ्या सर्व दर्जाच्या नोकरांचा समावेश होतो. हिंदुलोकांच्या पूर्वीच्या सम-<noinclude>{{center|४८}}</noinclude> modmz6wsknrx9jjhnlbb4trxwvl2vr4 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५५ 104 110042 230232 229574 2026-05-20T12:40:14Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230232 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /> {{right|<u>'''साक्रेटिस.'''</u>}}</noinclude>जुतीत किती फरक झालेला दिसत आहे, शेती उत्तम; व्यापार मध्यम व नोकरी कनिष्ठ, अशी म्हण होती; पण हल्लीं सुशिक्षित लोक नोकरीकरितां किती हपापलेले दिसतात! पूर्वीची या लोकांमधील विद्येकरिता विद्या शिकण्याची बुद्धि पार नाहींशी झालेली दिसत असून तिच्या ऐवजी ऐहिक हेतूंकरितां निवळ पोटाचा धंदा म्हणून शिकावयाची प्रवृत्ति झाली आहे, आणि म्हणून कनिष्ठ नोकरीबद्दल आतां कांहींएक दिक्कत न वाटतां ज्याला त्याला शिकून नोकरी मिळविण्याची हांव दिसत आहे. ही प्रवृत्ति कमी होणें आवश्यक असून अशा प्रकारची हांव थोडी कमी झाल्यासारखी दिसूं लागली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे.<br> {{gap}}"बरें, सरकारी नोकरी करावयाची, ती तरी उत्तम नेकीनें व नोकराच्या कर्तव्यकर्माला जागून होत आहे का? सरकारी नोकरांच्या खऱ्या कर्तव्याची जाणीव हिंदुलोकांच्या कवींना चांगलीच होती, असें दिसतें. कारण पंचतंत्रांत म्हटले आहे: - {{Block center|<poem>नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके; {{gap}}जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन; इति महति विरोधे वर्तमाने समाने {{gap}}नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता!</poem>}} {{gap}}"खरोखरी सरकारी नोकर म्हणजे ते लोकांचे आणि राजाचे असे दुहेरी नोकर असतात. प्रत्यक्ष ते सरकारचे नोकर असतात, पण लोकांकडूनच कराच्या रूपानें घेतलेल्या पैशाने त्यांना वेतन मिळते, अर्थात् लोकांचेही हित पाहणें हें त्यांचे काम आहे. म्हणजे सरकार व प्रजा यांच्यामध्ये समतोल कांटा धरून वागणे, हें यांचें खरें कर्तव्य आहे. परंतु असे वागणारे किती विरळा! हल्ली हिंदुस्थानांतील सरकारी नोकरांत अशा जाणीवेचे कांही लोक आहेत खरे; पण बहुतेक नोकरांमध्यें कर्तव्यबुद्धीचा अभाव, ज्या सरकारची नोकरी करावयाची, त्याच सरकारच्या धोरणाची खास नालस्ती करणारे, सरकारावर ओठ चावणारे, सरकार जुलमी आहे व लोकांच्या अनहिताच्या गोष्टी करतें, असें मागून बोल-<noinclude>{{center|४९}} <Br>{{gap}}सा...४</noinclude> 9txw4tf8mdhhh6ip1l7ex0h0lhu90s9 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५६ 104 110043 230233 229582 2026-05-20T12:43:21Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230233 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>णारेच फार. अशा बोलण्याने हे लोक आपण मोठे जनपदहित करणारे आहोत, असा आव घालतात. पण ही निवळ लबाडी असते. हेच लोक सरकारी अधिकाऱ्याजवळ गेले, म्हणजे सरकारचे गोडवे गाऊं लागतात. सारांश, वरून स्वतंत्रपणाचा व परोपकाराचा बहाणा करून आंतून अशा प्रकारचे लोक स्वार्थाकरतां हपापलेले असतात.<br>{{gap}}"कांहीं सरकारी नोकर अंतरंगी व बहिरंगी स्तुतिपाठकच असतात. यांना सर्व वेळी सरकारचीं स्तुतिस्तोत्रे गाण्यांतच आनंद वाटतो व सरकारी नोकर या नात्यानें आपण सरकारचें अगदी गुलाम आहोत, असें वाटतें. सरकारचें हित करणें- मग त्यांत लोकांचे कितीहि नुकसान होईना त्याची ते पर्वा करीत नाहींत हेंच आपले इतिकर्तव्य समजतात. आपला स्वाभिमान न सोडतां, आपल्या देशप्रीतीला रजा न देतां, पण ज्या सरकारचें आपण अन्न खातों, त्यांच्याबद्दलहि योग्य अभिमान मनांत बाळगून सरकारी नोकरी करणारे किती विरळा दिसतात! हीच नोकराची खरी कर्तव्यबुद्धि! या योगानें लोक व सरकार या दोघांचे हित होऊन अशा नोकराची स्वतःची दानतही उच्च दर्जाची राहते. परंतु जो हांजीहांजीपणा हेंच आपले कर्तव्य कर्म समजतो, त्याची दानत अगदी खालच्या दर्जाची बनत जाते; त्याचा स्वाभिमान लयाला जातो; देशाभिमानापेक्षां देशद्रोह बळावतो; व असा मनुष्य सरकारचें व लोकांचेही काम बरोबर करीत नाहीं. पण सरकारला वरवर शिव्या देणारे पण त्यांची नोकरी करणारे तर दानतीने जास्तच वाईट; यांच्यामध्यें दुटप्पीपणा फार येतो; यांच्यामध्ये गर्व व हांजीहांजीपणा असे परस्परविरोधी गुण येऊ लागतात व असे लोक पहिल्यापेक्षांही भयंकर होतात. यांची दानत अगदीच नीच कोटीमधली बनते. पण हल्लीं हिंदुस्थानांत अशांचा भरणा काय कमी आहे? हा परिणाम अर्धवट ज्ञानाचा व कर्तव्यबुद्धीच्या अभावाचाच होय.<br>{{gap}}"या वकिलांच्या जातीचें आतां निरक्षिण करूं या. खरोखर ही जात ब्रिटिश कायद्यामुळेच उत्पन्न झाली आहे. जुन्या काळीं पंचांनीं न्याय करण्याची पद्धति असे. तेथे साधारण विचारपूस करून खरें पाहून पंचांनी<noinclude>{{center| ५० }}</noinclude> 9kek7mwlz8yo5q2d9cksadido0jq6dc पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५७ 104 110044 230234 229689 2026-05-20T12:45:27Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230234 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /> {{right|<u>'''साक्रेटिस.'''</u>}}</noinclude>निकाल दिला म्हणजे झाले असा प्रकार असे. राजाच्या न्यायकचेरीत गेलें तरी न्यायाधीशच स्वतः वादीप्रतिवादींचे म्हणणे व त्यांचा साक्षीपुरावा पाहून निकाल देई. परंतु इंग्रजी कायदा सुधारलेला. त्या कायद्याचा शब्दावर भर असा कायदा साध्या भोळ्या लोकांना कसा कळावा? तेव्हां कायदा जाणणाऱ्या मध्यस्थांची जरूरी उत्पन्न झाली. कारण स्वतः वादीप्रतिवादींना कायद्याच्या कलमांची गुंतागुंत काय कळणार? तेव्हां न्यायकोर्टापुढे वकिलांच्या मुखानेंच जाणें प्राप्त. याप्रमाणें ही जात एका विशिष्ट परिस्थितीमुळे उत्पन्न झाली. आतां या नव्या जातीचे कर्तव्य उघड आहे. अशिक्षित व अडाणी वादीप्रतिवादींना कायद्याच्या कलमाबद्दल व त्यांच्या अर्थाबद्दल योग्य सल्ला देऊन त्यांना योग्य न्याय मिळवून देण्याची खटपट करणें हें त्यांचे कर्तव्यकर्म म्हणजे परकी, पण सुधालेले सरकार व अडाणी अशिक्षित लोकसमुदाय यांमधले दुभाषीच वकील होत. अर्थात् केवळ कायद्याचे खरे हेतु लोकांना समजावून देणें, तसेच कायद्यानेच दिलेल्या लोकांच्या हक्कांचे रक्षण करणे व त्या हक्कांची पायमल्ली होत असल्यास तिचा प्रतिकार करणें, या गोष्टींचा यांत समावेश होतो व हें कर्तव्यकर्म उत्तम प्रकारें बजावतां यावें, म्हणून प्रथमतः या वकीलवर्गाने कायद्यांचें, कायदेशास्त्रांचं आणि राजनीतिशास्त्राचें उत्तम अध्ययन केले पाहिजे. शिवाय कायदा हा नेहमी वाढता विषय आहे. त्यासंबंधी नव्यानव्या कल्पना, नवे नवे ठराव व रूढी नेहमीं बाहेर येत असतात. या सर्व गोष्टींचें यथासांग ज्ञान वकिलाला पाहिजे. सारांश, वकिलानें आजन्म विद्यार्थी राहिलें पाहिजे. त्याच्या विद्याव्यासंगाला खळ पडतां कामा नये. तसेच तंटे वाढविणें, लोकांना खोटीच सल्ला देऊन त्यांना भांडणांना उत्तेजन देणें, सारांश, कज्जेदलालाच्या प्रवृत्तीला योग्य वळण लावून खऱ्याखोट्याच्या निर्णयाला मदत करणें हें वकीलाचे खरें कर्तव्यकर्म आहे. परंतु अशी कर्तव्याची खरी जाणीव असलेले वकील या वर्गात फारसे दिसत नाहींत. एकदां परीक्षा पास झाली म्हणजे पुस्तकांना रामराम ठोकणारे व दरवर्षी जुनाट बनत<noinclude>{{center|५१}}</noinclude> rp2o68gzrsdo402ilvuetdnkgvzjbbn पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५८ 104 110045 230235 229634 2026-05-20T12:47:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230235 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>चाललेल्या आपल्या ज्ञानपुंजीवर वेळ मारून नेणारे, मोठ्या पुस्तकांतून कायद्याचा आधार काढावयाचा असेल, तर फी जास्त पडेल, अशा प्रकारची बतावणी करून जास्त फी उकळण्यापुरता कायद्याच्या पुस्तकांचा उपयोग करणारे वकील फार. पण बांधलेली शिदोरी किती दिवस पुरणार? या रीतीनें अशा वकीलांची फारशी चलती चालत नाही. या वकिलांपैकी काहींना पैशापलीकडे कांहींच दिसत नाहीं. कशा तरी तऱ्हेनें लोकांमध्यें कलागती लावून आपण जास्त जास्त पैसा कसा उकळावा, याकडेच त्यांची दृष्टि असते. तसेंच आपल्या स्वार्थाकरतां न्यायाधीशाची व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या इतर सरकारी अधिकाऱ्यांची खुशामत करून कांहीं वकील लोक आपल्याला सरकारी नोकरांच्याही खालच्या दर्ज्याला पोहचवून घेतात. सारांश, सुशिक्षितांच्या या एका मोठ्या वर्गाची सामान्य स्थिति शोचनीयच आहे. वास्तविक सर्व धंद्यांमध्ये वकिलीसारखा स्वतंत्र धंदा नाहीं. या वर्गाचे लोक सामान्य जनसमूहाचे स्वाभाविक लोकनायक असतात व तशा स्वतंत्र बाण्याने राहण्यासारखा त्यांचा दर्जा असतो. एका दृष्टीनें लोकांना चांगले वरण लावण्याचे त्यांचे काम असते. परंतु या वर्गाला ही खऱ्या कर्तव्याची ओळख झालेली नाहीं व म्हणून त्यांच्यामध्यें अज्ञान व आपस्वार्थीपणा भरलेला आहे. असो.<br>{{gap}}"सुशिक्षितांचा तिसरा वर्ग म्हणजे डॉक्टर व एंजिनीयर या धंदेवाल्यांचा होय. यांपैकी स्वतंत्रपणानें एंजिनीयरचा धंदा करणारे हिंदुस्थानांत क्वचितच दृष्टीला पडतात. कारण घरे बांधतांना नकाशा काढून, हवा, उजेड व इतर आयुर्वर्धक गोष्टींची घरांत सोय करणें जरूर आहे, अशी जाणीवच लोकांमध्ये झालेली नाहीं. 'पिच्छेसे आई' या म्हणीप्रमाणें हिंदुस्थानांतील घरे बांधण्याची पद्धति आहे. नवीन सुखसोईची, आयुरारोग्याच्या साधनांची कल्पनाच नाहीं. यामुळे घरे बांधतांना या गोष्टींचा विचार करावा, असें लोकांना वाटत नाहीं व म्हणून शास्त्रीय पद्धतीने घरे बांधणाऱ्या एंजिनीयरांचीही लोकांना गरज नाहीं. हल्लीं<noinclude>{{center|५२}}</noinclude> gb2drczh8i55iaetkp5j5n4fv5lqdyo पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५९ 104 110046 230236 229696 2026-05-20T12:49:54Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230236 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''साक्रेटिस.'''</u>}}</noinclude>हिंदुस्थानांत जे एंजिनीयर आहेत, ते बहुतेक सरकारी नोकर आहेत. व त्यांच्यामध्ये सरकारी नोकरांचे दोष आहेत. शिवाय आपल्या धंद्याचे पूर्ण ज्ञान मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेचाहि त्यांच्यांत अभाव आहे. डॉक्टरांच्या धंद्यांत बरेच लोक खाजगी धंदा करणारे आहेत; परंतु येथेंहि वकिलांच्यासारखीच रड आहे. स्वतःच्या धंद्याचे ज्ञान आजतागाईतचे पाहिजे, ही बुद्धि क्वचितच दिसून येते. वैद्यकशास्त्रामध्ये तरी वारंवार नवे नवे शोध लागतात. या सर्व शोधांचा फायदा आपल्या रोग्याला करून देण्याची बुद्धि या वर्गात फारशी दिसत नाहीं. कॉलेजांत जे कांहीं ज्ञान मिळविले असेल, त्याच ज्ञानावर काम भागविण्याची बहुतेकांची प्रवृत्ति स्वतः प्रयोग करून वैद्यशास्त्रांत भर घालण्याचें नांवच नको. पाश्चात्य व पौरस्त्य या देशांत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची बुद्धिसुद्धां कमीच आहे. कांहींची दृष्टि निव्वळ पैशाची आहे. तो मिळविण्याकरितां रोग्याचे दुखणें दिरंगाईवर पडेल, असें करण्याची नीच प्रवृत्तीहि कांहीं डॉक्टरांमध्ये दिसून येते. कांहीं डॉक्टर स्वतःची बुद्धि व विचारशक्ति यांचा बिलकुल उपयोग न करितां नवीन व्यापारी कंपन्यांचा दिखाऊ औषधी माल खपविणारे एजंटच बनतात. यांना रोग्यांना नवीं नवीं पेटंट औषधे व कृत्रिम अन्न देण्याचीच खोड लागलेली असते. आपले खरे कर्तव्यकर्म म्हणजे आजारी माणसाला आराम पाडून रोगबीज नाहीसे करणें होय, हे हे लोक विसरतात. रोग्याला पाहिलें न पाहिलें, तो एकादा औषधाचा पाठ लिहून आठ आणे रोग्याकडे लागू करण्याची प्रवृत्तिच जास्त लोकांत दिसून येते. बरोबर रोगचिकित्सा करून, मग पूर्ण विचार करून एकादी योग्य औषधयोजना करण्याच्या ऐवजी कांहीं डॉक्टरांना वरवरच्या लक्षणावर तात्पुरती योजना करण्याची खोड दिसते. आज जरा पोट दुखले, घाला एक औषध जास्त; आज पोटदुखी बंद आहे, पण कपाळच दुखलें, काढ एक औषध व दे एक पूड घालून! आज काय तिसरेंच लक्षण झालें, कर त्याची तजवीज असा प्रकार पुष्कळ डॉक्टरांचा असतो.{{nop}}<noinclude>{{center|५३}}</noinclude> 1vfd7jz6278jb9uzjd6b68tjhypo964 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६० 104 110047 230237 229693 2026-05-20T12:52:18Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230237 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>{{gap}}"एकदां मनुष्य रोगग्रस्त झाला, म्हणजे त्याची प्रकृति फार नाजुक होऊन ती तोळेवजा झालेली असते, व यापुढे बारीकसारीक बाह्य परिस्थितिभेदानें लक्षणांत कमीजास्तपणा होतो. सायंकाळी सूर्य अस्ताला जात असतांना क्षितिजाच्या रंगांत क्षणोक्षणीं नवीन बदल होत असतो- आतां तांबडा, तर आतां सोनेरी; आतां पिवळा तर आतां निळा; अशा किती तरी छटा क्षितिजावर येतात पण, त्यामुळे सूर्यास्ताच्या मुख्य गोष्टींत फरक होत नसतो, त्याचप्रमाणे रोगग्रस्त माणसाची गोष्ट असते, व म्हणून रोगाचे निदान केल्यावर त्या रोगाच्या प्रतिकारार्थ अनुभवानें ठरलेली औषधयोजना केली पाहिजे, व क्षणोक्षण जरी लक्षणे बदलली, तरी लहान मुलांच्या खेळांतील 'पातळ झाले पीठ घाल, घट्ट झालें दूध घाल,' असा प्रकार शास्त्रीय पद्धतीने जाणाऱ्या डॉक्टरांनी करतां कामा नये, हें डॉक्टरचे खरे कर्तव्यकर्म आहे. परंतु कांहीं डॉक्टरांची प्रवृत्ति याच्या उलट असते. आपल्या रोग्यांना खूष करणे एवढाच अशा त्यांच्या साऱ्या खटपटीचा उद्देश असतो, परंतु ही प्रवृत्ति दुखणे वाढण्यास निदान दिनावधीवर नेण्यास कारणीभूत होते, हें या डॉक्टर लोकांच्या ध्यानांत येत नाहीं किंवा आलें तरी आपली तुमडी भरण्याकरतां ते त्याची फिकीर करीत नाहींत.<br>{{gap}}"यानंतरचा सुशिक्षितांचा वर्ग किंवा जात म्हणजे वर्तमानपत्रे, मासिकपुस्तकें वगैरेंचे संपादक व निवळ लेखनाच्या धंद्यावर उपजीविका करणारा वर्ग. हिंदुस्तानांत हाही वर्ग एका दृष्टीनें व वकिलाप्रमाणेंच नवा आहे. पूर्वकाळी लेखक नव्हते, असें नाहीं. पूर्वीच्या लेखकांनी संस्कृत, पाली व इतर निरनिराळ्या प्राकृत भाषांमध्ये अवाढव्य वाङ्मय करून ठेविलें आहे. आज जर हिंदुस्तानची कीर्ति सर्व जगभर पसरली असली, तर ती त्या देशांतील संस्कृतभाषेतील अनुपम वाङ्मयामुळेंच होय. परंतु, पूर्वकाळ विद्याव्यासंगी लोक आपापल्या आवडीच्या विषयावर निरानराळे ग्रंथ लिहीत असत. ते ग्रंथ लिहिण्यांत उपजीविका करण्याचा हेतु नसे, व पूर्वकाळीं हल्लीसारखी छापण्याची कला माहिती नसल्या-<noinclude>{{center|५४}}</noinclude> gg2flnipg74eu2cbhc999xdxa16as8s पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६१ 104 110048 230238 229632 2026-05-20T12:55:00Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230238 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''साक्रेटिस.'''</u>}}</noinclude>मुळे ग्रंथाचा प्रसार ताबडतोब होण्यास कांहीं एक साधन नसे. परंतु, हल्लीं हिंदुस्तानांत युरोपांतून छापण्याची कला आली आहे, व तिच्यायोगानें पुस्तकें स्वस्त झाली आहेत. शिक्षणप्रसारामुळे वाचनाची गोडी लागली आहे, व यामुळें यूरोपांतल्याप्रमाणे वर्तमानपत्रांचा व मासिकांचा एक स्वतंत्र धंदा झाला आहे; तसेंच मनोरंजक व इतर पुस्तकें लिहून त्यांवर उपजीविका करण्याचा एक नवीन धंदा उत्पन्न झाला आहे; परंतु येथे सुद्धां कर्तव्यबुद्धीपेक्षां दुसऱ्या मनोविकारांचे प्राबल्य दिसत आहे. पूर्वी लोकप्रीति हा प्रकार लोकांना ठाककच नव्हता. प्रत्येक माणसांत शांतपणे व गाजावाजा न करितां काम करण्याची बुद्धि जाऊन त्या ठिकाणी लोकप्रीतीचें वारे उत्पन्न झाले आहे. खरोखर लोकप्रीतीची आवड, म्हणजे एखाद्या मादक पदार्थाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणें माझ्या प्रिय ग्रीस देशांत डेमेगॉन नांवाचा लोकप्रीति संपादन करून आपला स्वार्थ साधणारा वर्ग उत्पन्न झाला, त्याप्रमाणे येथल्या सुशिक्षितांतहि प्रकार झाला आहे. कित्येक चांगले बुद्धिवान् व प्रतिभासंपन्न लेखक या लोकप्रीतीच्या पिशाचानें पछाडलेले मला दिसत आहेत. यांना सत्यासत्याची पर्वा नाहीं, चांगल्या वाईटाची चाड नाहीं, पापपुण्याची भीति नाहीं, सदसद्विवेकबुद्धीची मुरवत नाहीं, खऱ्या लोकहिताची फिकीर नाहीं, न्यायान्यायाची निवड नाहीं; सारांश, ज्या प्रवृत्तींच्या योगानें मनुष्याच्या आत्म्याची खरी उन्नति होते, त्यांकडे त्यांचे लक्ष नाहीं. 'येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्' हे त्यांच्या वागणुकीचें तत्त्व. आपण प्रसिद्धीला येऊन आपला योगक्षेम चांगला चालला म्हणजे झाले, इतकंच अशा लोकांचं पाहणे. या देशांतील सुशिक्षितांमधील बरेच लोक- या लोकांचा भरणा वर्तमानपत्रकर्ते, लेखक, व्याख्याते यांमध्येच जास्त आहे- या बौद्धिक व्यसनाच्या नादी लागले आहेत, ही मोठी शोचनीय गोष्ट आहे.<br>{{gap}}"आतां सुशिक्षितांमधली शेवटली जात, म्हणजे शिक्षकवर्गाची होय. या वर्गाचें काम सर्व बहुजन समाजामध्यें ज्ञानप्रसार करण्याचे आहे, हे उघड आहे. बहुजनसमाजाच्या पुढारीपणाचा मान एकंदर सुशिक्षित<noinclude>{{center|५५}}</noinclude> 98p8k6m3619jneqaog89gwk3hgj323l पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६२ 104 110049 230239 229630 2026-05-20T12:57:16Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230239 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>वर्गाकडे येतो. त्यांतल्यात्यांत ज्यांचे काम विद्यादान करण्याचे आहे, त्यांच्याकडे तर हा पुढारीपणा प्रामुख्यानेंच येतो. पूर्वीच्या काळीं हे काम ब्राह्मणवर्णाचें होतें, व त्याकाळचे ब्राह्मण अध्ययन व अध्यापन यांमध्येच आपला सर्व वेळ खर्च करीत असत. परंतु, अशा प्रकारची उच्च कर्तव्यजागृति या शिक्षकवर्गामध्येसुद्धां कमीच दिसते. आधीं या धंद्यांत पडणारे सुशिक्षित धंद्याच्या आवडीखातर यामध्ये पडणारे फार थोडे. दुसऱ्या जास्त किफायतीच्या धंद्यांत आपली सोय लागत नाहीं, असे दिसून आल्यावरं निरुपाय म्हणून या शिक्षकाच्या धंद्यांत पडणारे फार. जी विद्या आपण शिकवितों, तिच्याबद्दल योग्य अभिमान वाटणारे, विद्यावृद्धि हाच देशाच्या तरणोपायाचा खरा मार्ग आहे, व अशी जीवंत आणि जागरूक जाणीव असलेले, या विद्यार्जनांत व विद्यादानांत आपले सर्व सामर्थ्य खर्च करणारे शिक्षक दुर्लभ भाड्याच्या तट्टाप्रमाणे कसें बसें ओझें वाहणारेच फार! ज्यांना आपण शिकवितों त्या विद्येबद्दल अभिमान वाटत नाहीं, ज्यांना जनसमूहांत विद्येच्या प्रसाराचा केवढा फायदा आहे याची जाणीव नाहीं, ज्यांना विद्येची खरी गोडी नाहीं, जे विद्यादेवीचे निस्सीम भक्त नाहींत, त्यांच्या हातून विद्यादानाचे काम किती सें चोख होणार! म्हणूनच या वर्गातहि कामचुकार लोक फार आहेत. शिक्षकाचा धंदा हे लोक उपजीविकेचे साधन म्हणून करतात. यामुळेच या वर्गाकडून शिक्षणप्रसाराच्या बाबतींत जितकी जोराची खटपट व्हावयाला पाहिजे तशी होत नाहीं.<br>{{gap}}सारांश, माझ्या ग्रीसदेशांतील माझ्या बांधवांमध्ये जे दोष मी पाहिले व जे घालविण्याचा मी आजन्म प्रयत्न केला, त्याचप्रकारचे दोष या देशांतहि दिसत आहेत. तरी आपण आतां या देशांत जन्माला येऊन येथल्या लोकांचे कान उघडून त्यांच्यामध्ये कर्तव्यजागृति व डोळस श्रद्धा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू या, म्हणजे माझ्या मनाला जास्तच आनंद होईल."<Br> {{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}{{nop}}<noinclude>{{center|५६}}</noinclude> 7qahgx8gl7aunvlptr53vgybs6mgf02 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६३ 104 110268 230241 229697 2026-05-20T13:04:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230241 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br> {{center|{{xx-larger|'''जॉर्ज बार्क्ले'''}}}} {{rule|7em}} {{center|{{x-larger|'''( १ )<br>अल्प चरित्र.'''}}}}<Br> {{gap}}कोणत्याही देशाकडे दृष्टि फेका. तुम्हांला सर्वत्र सरस्वतिमंदिर मुक्तद्वार दिसेल. तेथे वयाने लहान मोठा हा भेद मानला जात नाहीं, तेथे स्त्री-पुरुष या भेदास महत्व नाहीं, तेथे गरीबी-श्रीमंती इकडे लक्ष्य दिले जात नाहीं, तेथें हीनकुल किंवा उच्चकुल याची आडकाठी येत नाहीं, तेथे वंशपरंपरा किंवा पूर्वसंस्कार या गोष्टी पहाव्या लागत नाहींत, तेथे सामाजिक दर्जा किंवा धंदा याचाही अडथळा येत नाहीं. सारांश, सरस्वतीचे दारी कोणालाहि मज्जाव नाहीं, सरस्वतीचा वरदहस्त कोणावर पडेल, हें कांहीं एक सांगतां येत नाहीं; परंतु एकदां का सरस्वतीचा वरद हस्त एखाद्या माणसावर पडला म्हणजे तो तत्काळ सरस्वतिभक्त होतो व त्याला सरस्वतिमंदिरांत अग्रपूजेचा मान मिळतो.<br>{{gap}}जॉर्ज बार्क्ले हा ब्रिटिश बेटांत एक मोठा सरस्वतिभक्त व तत्त्ववेत्ता होऊन गेला. त्याचा जन्म सन १६८५ मध्ये अत्यंत हीन व गरीब कुलांत झाला. बार्क्लेच्या आईबापांमध्ये कोणत्याही प्रकारचे विशेष गुण नव्हते. तीं आपली साधीभोळी सामान्य माणसे होती. त्यांना सरस्वतीचा पूर्वसंस्कार कांहीं एक नव्हता. तेव्हां बार्क्लेमध्ये सरस्वतिभक्ति पूर्वसंस्काराने आली असे मुळींच म्हणतां येत नाहीं. बार्क्ले- घराण्यांत जॉर्ज हा अकस्मात् एकाएकीं उदय पावणाऱ्या धूमकेतूप्रमाणे होता, असे म्हणणें प्राप्त आहे.<br>{{gap}}बार्क्ले हा १६९६ साली किलकेनीच्या शाळेत जाऊ लागला. 'गली-<noinclude>{{center|५७}}</noinclude> agijp7bmes0wzbkd8cn613u18kk6705 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६४ 104 110269 230242 229735 2026-05-20T13:07:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230242 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>व्हरचा वृत्तांत' या जगप्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता स्विफ्ट हा बार्क्लेप्रमाणेंच आयरिशमन असून याच शाळेंत शिकलेला होता. या शाळेत बार्क्लेनें चार वर्षे काढली. या प्रदेशामध्ये सृष्टिदेवीचें मनोहर रूप दृग्गोचर होत असल्यामुळे बार्क्लेला सृष्टिसौंदर्याची गोडी लागली, व त्याची अवलोकनशक्ति सूक्ष्म झाली. याचें प्रत्यंतर त्याच्या ग्रंथांत वारंवार दिसून येतें. सन १७०० मध्ये बार्क्ले हा मॅट्रिक्युलेशन परीक्षा पास झाला, व पुढील शिक्षणाकरितां तो आयर्लंडची राजधानी जी डब्लिन तेथल्या युनिव्हर्सिटीतील ट्रिनिटी कॉलेजांत दाखल झाला. येथे त्यानें विद्यार्थी व शिक्षक या नात्यानें आपल्या आयुष्याचीं तेरा वर्षे काढली. कॉलेजांत त्याच्या बुद्धीचा झपाट्याने विकास होऊं लागला व त्याला आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय ज्ञानाची गोडी लागली. त्यानें कॉलेजांत असतांना वेळोवेळीं आपल्या वाचनावरून सुचलेल्या विचारांचे, तसेंच त्यावरून सुचलेल्या प्रश्नांचें व स्वयंस्फूर्तीनें मनांत आलेल्या कल्पनांचें टिपण करून ठेवलेलें आहे. ही बार्क्लेची टिपणवही त्याच्या मृत्यूनंतर कांहीं वर्षांनी छापली गेली. या टिपणवहीवरून त्याचे आध्यात्मिक विचार कसकसे बनत गेले, व शेवटीं जें तत्वज्ञान त्याने जगाला शिकविलें त्याचा उगम त्याच्या मनांत कशा तऱ्हेनें झाला, हें फार चांगल्या तऱ्हेनें दिसून येते. कॉलेजांतील बार्क्लेच्या आयुष्यक्रमावरून त्याच्या भावी मोठेपणाची चिन्हें दिसून येतात. त्याच्या वेळच्या विद्यार्थ्यांना ते एक विलक्षण कोडेच वाटे. त्याच्यापासून दूर दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तो एक अजागळ विद्यार्थी वाटे, व त्याप्रमाणे त्याची ते थट्टाहि करीत; पण बार्क्लेचा निकट संबंध असलेल्या विद्यार्थ्यांना मात्र त्याची बुद्धिमता, त्याची ज्ञानतृष्णा व त्याची उद्यमप्रियता पाहून बार्क्लेचें कौतुक वाटत असे. प्रत्यक्ष सत्यज्ञान मिळविण्याकरितां तो आपला जीवहि धोक्यांत घालण्याला कसा तयार असे, याबद्दलची एक मौजेची गोष्ट बार्क्लेच्या चरित्रकारांनी लिहून ठेविली आहे, ती येथे सांगण्यासारखी आहे.<Br>{{gap}}बार्क्ले व कँटिरिनी (हा प्रसिद्ध इंग्लिश ग्रंथकार गोल्डस्मिथ याचा<noinclude>{{center|१८}}</noinclude> c26hu69alf8d6dbtskst19ft96lcw0s पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६५ 104 110270 230243 229737 2026-05-20T13:10:55Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 230243 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बाक्ले.'''</u>}}</noinclude>पुढे मेहुणा झाला) या नांवाचा त्याचा सोबती असे दोघेजण एकदां फांशीची शिक्षा अमलांत येत असतां ती पाहण्याला गेले. बार्क्ले तेथून परत आला, तो उदास अशा मनःस्थितींत आला; पण फांसावर चढविला जात असतांना त्या गुन्हेगाराला काय संवेदना होत असतील, याबद्दल बार्क्लेचा सारखा विचार चालला होता. आपल्या या विलक्षण जिज्ञासेबद्दल बार्क्लेनें कँटिरिनीजवळ गोष्ट काढली, व दोघां मित्रांचे असें ठरलें कीं, फांशीं जातांना काय वाटतें, याबद्दल प्रथम बार्क्लेनें प्रयोग करून पहावा, आणि मग कँटिरिनीनें तोच प्रयोग आपल्यावर करावा. मी खूण केली कीं मला फांसावरून सोडवा असें बार्क्लेनें सांगितलें होतें. ठरल्याप्रमाणें वरच्या तक्तपोशीला दोरखंड बांधून बार्क्लेनें आपल्या मानेला त्याचा शेवट बांधला, व खालची खुर्ची कॅंटिरिनीला काढून घेण्याला सांगितलें, खुर्ची काढून घेतांक्षणींच बार्क्लेला बेशुद्धी येऊन ठरलेली खूण करण्याचे सामर्थ्य राहिलें नाहीं. पण खुणेची अधिक वाट न पाहतां त्याच्या मित्रानें त्याला फांसावरून सोडविलें नाहीं तर बार्क्ले खराखुराच फांशी जाण्याची पाळी आली होती! दोरी सोडल्यावर बार्क्ले भूमीवर निश्चेष्ट पडला. कांहीं वेळानें सावध झाल्यावर बार्क्ले एकदम म्हणाला "वाहबारे कँटिरिनी! माझा गळपटा तूं चुरडलास!"<br>{{gap}}बार्क्लेच्या प्रयोगानंतर अर्थातच कॅंटिरिनीला त्याप्रमाणें स्वतःवर प्रयोग करून घेण्याची इच्छा झाली नाहीं! या गोष्टीवरून बार्क्लेचा धाडशी स्वभाव, त्याची ज्ञान मिळविण्याची हौस आणि विशेषतः त्याचा आध्यात्मिक ज्ञानाकडे ओढा, हीं चांगली दिसून येतात.<br>{{gap}}बार्क्लेचा ट्रिनिटी कॉलेजांतील शिक्षणक्रम चांगल्या तऱ्हेने पार पडला. त्याला १७०२ मध्ये शिष्यवृत्ति मिळाली. १७०४ मध्ये तो बी. ए. ची परीक्षा पास झाला, व १७०७ मध्यें त्यानें एम्. ए. ची पदवी मिळविली. पररीक्षेत त्यानें असामान्य विद्वत्ता दाखविली, म्हणून त्याला युनिव्हर्सिटी फेलोशिप देण्यांत आली. १७०७ पासून १७१२ अखेर बार्क्ले ट्रिनिटी कॉलेजांत शिक्षकाचें काम करीत होता. १७०९ मध्ये त्यानें उपाध्या-<noinclude>{{center|५९ }}</noinclude> e6sacapf4bhk1b4wpehksqz67qqhubj पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६६ 104 110315 230244 229894 2026-05-20T13:18:18Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230244 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>याचीहि दीक्षा घेतली होती; पण तो कित्येक उपाध्यायांप्रमाणे आग्रही धर्माभिमानी कधींहि झाला नाहीं, व त्याची 'सत्याची आवड' आमरणांत कायम राहिली.<Br>{{gap}}बार्क्लेच्या टिपणवहीवरून त्याच्या मनांत घोळणाऱ्या विषयांची चांगली कल्पना येते. पण ही मनांतली खळबळ आंतच न जिरतां ती लेखनद्वारां प्रगट झाली. बार्क्लेने पहिले दोन लहान लहान निबंध १७०७ च्या आधींच लिहिले, व प्रसिद्ध केले. हे दोन्ही निबंध गणितासंबंधींच्या कांहीं प्रश्नांबद्दल होते, व ते लॅटिन भाषेमध्ये लिहिले होते. पण ज्या दोन ग्रंथांच्या योगाने बार्क्लेने तत्त्वज्ञान्यांच्या मालिकेत एकदम वरची जागा पटकाविली, ते दोन ग्रंथ त्याने या लहान निबंधांनंतर दोनतीन वर्षातच लिहिले. 'दृष्टीची नवी उपपत्ति' हा बार्क्लेचा पहिला तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ होय. हा त्यानें १७०९ या सालीं प्रसिद्ध केला. या निबंधांत बार्क्लेनें मनुष्याच्या अवलोकनशक्तीची मीमांसा करून असें ठरविलें कीं, वस्तूचा आकार व अंतर ही आपल्या दृष्टीला दिसतात असे आपण म्हणतों खरें, पण वास्तविक ती आपल्याला दिसत नाहींत. कारण, दृष्टीचा खरा विषय म्हणजे रंग होय. वस्तूच्या अंधुक किंवा स्पष्ट रंगचित्रावरून आपण वस्तूचें अंतर व आकार यांचा केवळ अंदाज करतों. अंतर व आकार हे पदार्थांचे गुण स्पर्शगम्य आहेत, ते दृष्टिगम्य नाहींत, असें बार्क्लेनें प्रतिपादन केलें. या निबंधाचा तत्वज्ञानविषयक मथितार्थ असा होता कीं, जडसृष्टीचें जें ज्ञान आपणाला होतें तें सर्व मानसिक संवेदनांच्या योगानें होतें.<br>{{gap}}याच्या पुढचा ग्रंथ बार्क्लेनें दुसऱ्याच वर्षी म्हणजे १७१० मध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथांत त्यानें आपले नवें मत जगापुढे ठेविलें, जड व चित् अशी स्वतंत्र तत्त्वे मानणाऱ्या तत्त्वज्ञानाचें बार्क्लेने या ग्रंथांत खंडन केले आहे. त्याचें म्हणणें सर्व जग हें चिन्मयच आहे. ज्याला सामान्य माणसें जडद्रव्य म्हणतात, तें संवेदनांचा समुदाय होय. आमरणान्त याच मताचे बार्क्लेने निरनिराळ्या ग्रंथांत उद्घाटन केलें आहे. या मतानें जगांतील नास्तिक्य नाहींसें होईल, असें बार्क्लेला वाटत असे. कारण सर्व<noinclude>{{center|६०}}</noinclude> ftadfp9084c9qy1yfbisn86wxm05uhz पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६७ 104 110316 230247 229919 2026-05-21T11:04:31Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230247 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>जग चिन्मय आहे, असे म्हटल्यावर जडवादाला जागाच राहात नाही, आणि मग जीवात्मा व परमात्मा एवढीच चिन्मय तत्त्वे शिल्लक राहतात, आणि या योगाने मनुष्याची खऱ्या धर्माकडे प्रवृत्ति होईल असें बार्क्लेला वाटत असे. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाचा हेतु मनुष्याला धर्मपरायण करण्याचा होता, व औपचारिक कर्मकांडात्मक धर्माचारापेक्षा याच तात्त्विक धर्माला बार्क्ले जास्त महत्त्व देत असे. या दोन ग्रंथांनी बार्क्लेची स्वतंत्र विचाराचा तत्त्वज्ञानी व उत्तम लेखक अशी ख्याति झाली.<br>{{gap}}काही अंशी प्रकृतीकरितां, आणि काही अंशी त्या काळच्या ग्रंथकारांचा परिचय करून घेण्याकरितां व साधल्यास आपल्या 'संभाषण' नामक पुस्तकाच्या प्रसिद्धीकरितां बार्क्लेने इंग्लंडमध्ये लंडनला जावयाचे ठरविले. त्याकरितां आपल्या ट्रिनिटी कॉलेजांतून त्याने रजा घेतली. तो इंग्लंडला आल्यावर त्याची लंडनमधल्या विद्वद्रत्नाशी ओळख करून देण्याची खटपट बार्क्लेचा देशबंधु 'गलिव्हरच्या वृत्तांता'चा प्रसिद्ध कर्ता स्विफ्ट, व प्रसिद्ध ग्रंथकार स्टील यांनी केली. दोघांचेंहि बार्क्लेच्या प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांवरून चांगले मत झालेले होते. त्यांनी आपल्या देशांतील या होतकरू तत्त्वज्ञान्याची राजदरबारीहि ओळख करून दिली. स्टीलच्या 'गार्डियन' या पत्रांत बार्क्ले निबंध लिहूं लागला. प्रत्येक निबंधाबद्दल त्याला एक गिनी मिळत असे. आपल्या मित्राच्या साहाय्याने बार्क्लेने ट्रिनिटी कॉलेजांत असतांना लिहिलेला तत्त्वज्ञानात्मक संभाषणाचा ग्रंथ लंडनमध्ये प्रसिद्ध केला. या ग्रंथाने त्याची सर्वत्र वाहवा होऊन त्याच्या मताचा झपाट्याने प्रसार झाला. त्याच्या मताला पुष्कळ अनुयायी मिळाले, व त्याची यूरोपांतील प्रमुख तत्त्वज्ञान्यांत गणना होऊ लागली.<br>{{gap}}बार्क्लेच्या या कीर्तीमुळे त्याला सरकरादरबारांत मान मिळू लागला व युरोपांत प्रवास करण्याची त्याला संधि आली. लॉर्ड पिटरबरो या वजनदार सरदाराची सिसिलीच्या राजाकडे वकील म्हणून नेमणूक झाली व त्याने बार्क्लेला आपला चिटणीस म्हणून बरोबर नेण्याचे ठरविले.<br>{{gap}}बार्क्लेच्या आयुष्यांतील ही प्रवासाची वर्षे त्याला फार आनंदांत गेली<noinclude>{{center|६१}}</noinclude> mmv6r3fzwf22g3cmfoumd2hzjecuixj पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६८ 104 110317 230248 229920 2026-05-21T11:10:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230248 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>व या त्याच्या प्रवासामुळे त्याला ग्रीक तत्वज्ञानाचा विशेष नाद लागून त्याच्या पुढील तात्विक मतांवर प्लेटो या ग्रंथकर्त्याच्या लेखांचा फारच परिणाम झाला. फ्रान्स, इटली व ग्रीस या देशांमधल्या मोठमोठ्या शहरांत बार्क्लेला महिनेच्या महिने राहण्याला सांपडले व त्याने आपल्या या निवासाचा पूर्ण फायदा करून घेतला. आपल्या प्रवासाची व त्या प्रवासांत पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांची सविस्तर वर्णने बार्क्ले इंग्लंडांतील आपल्या स्नेह्यांना पाठवीत असे. हा सर्व पत्रव्यवहार प्रसिद्ध झालेला आहे व त्यावरून बार्क्लेची सूक्ष्म अवलोकनशक्ति, त्याचा मार्मिकपणा, त्याची सदभिरुचि, व पाहिलेल्या गोष्टींचे हुबेहूब वर्णन करण्याची त्याची शैली ही उत्तम तऱ्हेने दिसून येतात.<br>{{gap}}सुमारे वर्षदीड वर्ष युरोपांत काढल्यावर ॲन राणीच्या मृत्यूमुळे मंत्रिमंडळांत फरक झाला, व लॉर्ड पिटरबरोंना परत यावे लागले. त्यामुळे बार्क्लेलाही लंडनला परतावे लागले. त्यामुळे बार्क्लेची प्रवासाची हौस पूर्ण झाली नव्हती. स्विफ्टच्या वजनाने बार्क्लेला एका श्रीमंत मुलाच्या खाजगी शिक्षकाची जागा मिळून तो पुनः इंग्लंडांतून युरोपांत गेला. या वेळी त्याला चार वर्षे युरोपात घालवितां आली. अर्थात् आयर्लंड सोडून त्याला एकंदर सात वर्षे झाली.<br>{{gap}}१७२० च्या सुमाराला बार्क्ले इंग्लंडांत परत आला. तों इंग्लंडमध्ये 'साउथ सी बबल' या नांवाने इंग्लंडच्या इतिहासांत प्रसिद्ध असलेल्या व्यापारी कंपनीचा बोजवारा होऊन लोकांची फार दैना झाली होती. बार्क्लेनें या बाबतींत एक निबंध प्रसिद्ध करून त्यांत त्याने लोकांच्या दोषांचे आविष्करण केले व हे दोष नाहीसे झाल्याखेरीज देशाचा तरणोपाय नाही असे प्रतिपादन केले. पण या प्रसंगाने निवळ तात्विक व वाङ्मयी विषयांपेक्षां सामाजिक सुधारणेकडे बार्क्लेचे जास्त लक्ष्य वेधले व कांहीं तरी लोककल्याणाचे प्रत्यक्ष काम आपण हाती घ्यावे, असा विचार त्याच्या मनांत घोळू लागला.<br>{{gap}}देशी परत आल्यावर बार्क्लेला आयुष्यक्रम कायम करण्याची संधि<noinclude>{{center|६२}}</noinclude> f6vayuwcoom8gaig9ihvtx8r3w7qdqy पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६९ 104 110318 230249 229921 2026-05-21T11:14:28Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230249 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>मिळाली. कारण त्याच्या कॉलेजांत तो आधीपासून फेलो होताच, पण परत आल्यावर त्याला अधिक पगाराच्या शिक्षकाच्या जागेवर नेमण्यांत आले. तसेच त्याने इंग्लंडांत असतांना उपाध्यायाच्या धंद्याची दीक्षा घेतली असल्यामुळे त्या कामावरही त्याला नेमण्यांत आले. पण लोककल्याणाची कल्पना त्याच्या डोक्यांत घोळत असल्यामुळे या स्वार्थी आयुष्यक्रमाने व उद्योगांनी त्याचे समाधान होईना. याच वेळी एका मृत्युपत्रान्वयें बरीच मोठी द्रव्याची देणगी त्याला मिळाली. यामुळे त्याच्या लोककल्याणाच्या इच्छेने उचल खाल्ली व आपण बरमुडा बेटांत जाऊन तेथे एक विद्यापीठ स्थापन करावे, असे त्याच्या मनाने घेतले. या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याकरतां आपल्याला मिळालेली सर्व संपत्ति, तसेंच आपल्याला दिलेल्या कॉलेजांतील व धर्मखात्यांतील मानाच्या व फायदेशीर जागाहि सोडण्याला तो तयार झाला. त्याने काही तरुण मंडळीला आपल्या बेताला अनुकूलं करून घेतले व आपल्या भावी विद्यापीठाला सरकारी सनद व सरकारी मदत मिळविण्याची खटपट करण्याकरतां बार्क्ले पुनः इंग्लंडांत आला.<br>{{gap}}पहिल्याप्रथम ज्याप्रमाणे स्विफ्टने बार्क्लेला राजदरबारी प्रवेश करवून दिला, त्याचप्रमाणे याहि वेळी त्याने बार्क्लेकरितां खटपट केली. बार्क्लेने आपला विद्यापीठाचा बेत सविस्तरपणे पुष्कळ जणांना सांगितला व त्याने खासगी गृहस्थांकडून पैशाच्या मदतीची आश्वासने घेतली. बार्क्लेच्या वक्तृत्वाने व कळकळीने या बेताला बरेंच स्वरूप आले. त्याने जॉर्ज राजाची मुलाखत घेतली व राजालाहि ही कल्पना पसंत पडली. मुख्य प्रधान वॉलपोल हा मोठा धोरणी, मुत्सद्दी व व्यवहारज्ञ होता. त्याला बार्क्लेची कल्पना अव्यवहार्य वाटली; पण राजाचा कल पाहून त्याने आपले विरुद्ध मत दिले नाही. त्याच्या मनाची अशी कल्पना होती, की, पार्लमेंटमध्ये ही योजना पसंत होणार नाही. पण येथे वॉलपोलची अटकळ फसली. कारण बार्क्लेने फारच खटपट केली. तो प्रत्येक सभासदाला जाऊन भेटला व आपल्या गोड भाषणाने त्याने<noinclude>{{center|६३}}</noinclude> n71wf61e8x2bznst1np8qul2z9j0ft5 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७० 104 110319 230250 229922 2026-05-21T11:19:10Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230250 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>आपल्या योजनेला सर्वांची अनुमति मिळविली, व वॉलपोलच्या अटकळीबाहेर बार्क्लेच्या योजनेला यश येत चालले. सनद देण्यासंबंधी व विद्यापीठाच्या घटनेसंबंधी व पैशाच्या मदतीसंबंधी ठराव पार्लमेंटांत पास झाले व चार वर्षांच्या खटपटीने आपली योजना मूर्त स्वरूप धारण करणार म्हणून बार्क्लेला मोठा आनंद झाला. आपल्या नव्या लोककल्याणाच्या कामगिरीवर जाण्यापूर्वी बार्क्लेने एका सुशील मुलीशी विवाह करून घेतला, व मोठया हुरुपाने १७२८ साली तो प्रथमतः रोडबेटांत जाण्याकरितां जहाजावर चढला.<br>{{gap}}आपल्या विद्यापीठाला सनद मिळण्याचे आणि वार्षिक वर्गणी मिळण्याचे सरकाराकडून आश्वासन मिळाले, आणि लोकांनीहि चांगला आश्रय देण्याचे कबूल केले, तेव्हां आतां कोणतेंहि विघ्न राहिले नाहीं. असें बार्क्लेला वाटले. पण बार्क्लेसारख्या सरळ, उत्साही व परोपकाररत पुरुषाला व्यवहारज्ञ, कुटिलनीतिनिपुण आणि स्वार्थी मुत्सद्यांच्या धोरणी वर्तनाचे बीज कसे कळावे? बार्क्ले रोड बेटांत जाऊन पोहोंचला. तेथली एकंदर सृष्टिशोभा आणि परिस्थिति पाहून आपल्या पहिल्या योजनेपेक्षा येथेच विद्यापीठ काढणे चांगले, असे त्याला दिसून आले. पण सरकारी वीस हजार पौंडांची मदत येण्याची तो वाट पहात होता. वॉलपोलच्या मनांत बार्क्लेच्या योजनेबद्दल मुळीच आस्था नव्हती. राजाच्या मर्जीविरुद्ध जायाचे नाही, म्हणून तो विरुद्ध नव्हता, इतकेंच. पण तो कोठावळा होता! प्रत्यक्ष पैसे देणे त्याच्या हातांत होते. जेव्हां बार्क्लेच्या मित्रांनी वॉलपोलला पार्लमेंटमध्ये पसार झालेल्या ठरावाप्रमाणे पैसे देण्याबद्दल तगादा लावला, तेव्हां त्याने दिलेले उत्तर लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो म्हणाला "प्रधान या नात्याने जर तुम्ही मला प्रश्न विचारीत असाल, तर मला असे म्हटलेच पाहिजे. आणि मी खातरीने म्हणेन, की, सरकारी खजिन्याला सवड झाल्याबरोबर पैसे दिले जातील! पण वीस हजार पौंडांच्या देणगीच्या भरवशावर डीन बार्क्लेने अमेरिकेत राहावे किंवा नाही, असे जर मित्रत्वाच्या<noinclude>{{center|६४}}</noinclude> 5esutuer17bgmtbwhps35mktgwueqr3 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७१ 104 110320 230251 229923 2026-05-21T11:22:30Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230251 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>नात्याने तुम्ही मला विचारीत असाल, तर बार्क्लेने ताबडतोब युरोपला परत यावे, व देणगीची आशा सोडावी, असें मी सांगेन."<br>{{gap}}याप्रमाणे मुख्य प्रधानाने एका उदार योजनेचा नाश केला, याबद्दल बार्क्लेला अत्यंत वाईट वाटले, हे उघड आहे.<br>{{gap}}सरकारी मदतीच्या भरवशावर बार्क्लेनें रोड बेटांत सुमारे शंभर एकरांचे एक शेत विकत घेऊन तेथे त्याने लहानसे घर बांधले, व त्याला राजाच्या स्मरणार्थ 'व्हाईट हॉल' असें नांव ठेवले. त्याचा येथला व्यवसाय म्हणजे अध्ययन व लेखन हा होता. दहा बारा वर्षात त्याला असा शांत वेळ मिळाला नव्हता. तेथली सृष्टिशोभाहि बार्क्लेला फार आवडत असे. समुद्रकाठची एका खडकाची गुहावजा जागा ही बार्क्लेची आवडती बसावयाची जागा होती. या ठिकाणीच बार्क्लेचा कुटुंबविस्तार झाला. येथे त्याला एक मुलगा व,एक मुलगी झाली पण दुर्दैवाने मुलगी फार दिवस जगली नाही.<br>{{gap}}सरकारी मदत मिळण्याची आशा नाही, हे ठाम झाल्यावर बार्क्लेला आपल्या योजनेचा नाद सोडून देणे भाग पडले, व तो आपल्या बायकांमुलांसकट १७३१ मध्ये इंग्लंडला परत आला. तरी बार्क्लेची अमेरिकेच्या सुधारणेची हौस कमी झाली नाही. त्याने आपले शेत येल विद्यालयांत शिष्यवृत्तीकरितां ठेविले. तसेच जमविलेल्या वर्गणीतून एक हजार पुस्तकांचा संग्रह त्याने येल विद्यालयाला नजर केला.<br>{{gap}}इंग्लंडांत परत आल्यावर दोन महिन्यांनी बार्क्लेने तत्त्वज्ञान या विषयावरील आपला सर्वात मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. हाहि संभाषणात्मक आहे. हा ग्रंथ बार्क्लेच्या सर्व ग्रंथांत अत्यंत लोकप्रिय झाला. रोड बेटामध्ये जी अवर्णनीय सृष्टिशोभा त्याला पाहण्याला सांपडली व तात्त्विक अध्ययन अणि मनन करण्याला जी स्वस्थता मिळाली, त्या दोहोंची छटा या ग्रंथांत दिसून येते. हा बार्क्लेचा ग्रंथ तात्त्विक विषयावर असूनहि तो फारच मनोरंजक झालेला आहे. त्याच्या ग्रंथावर काही ठिकाणी प्रतिकूल टीका झाली, व त्याला त्याने उत्तरात्मक दुसरे पुस्तक लिहिले.<noinclude>{{center|६५}} <Br>{{gap}}सा...५</noinclude> gfon1ds6mt8ujwzhk9dlu7aabewvbbh पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७२ 104 110321 230252 229924 2026-05-21T11:29:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230252 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>रोड बेटांतून परत आल्यावर एक वर्ष पर्यंत तो लंडनमध्ये राहिला, व या वर्षभर याचा सारखा लेखनव्यवसायच चालू होता.<br>{{gap}}१७३४ मध्ये बार्क्ले पुनः आपल्या देशी आयर्लंडला परत आला. अमेरिकेतील योजनेच्या बाबतीत सरकारच्या धोरणामुळे त्याची निराशा झाली होती. त्याची अंशतः भरपाई करण्याकरतां व काही अंशी बार्क्लेची थोर योग्यता मनांत आणून सरकारने बार्क्लेला क्लॉयॉनीची मोठ्या मानाची व हुद्याची बिशपची जागा दिली व बार्क्ले क्लॉयॉनी येथे राहण्याला गेला. येथे तो एकंदर अठरा वर्षे राहिला. बार्क्ले जरी प्रोटेस्टंटपंथी होता, तरी त्याची मतें उदार होती, आणि त्याचा देशाभिमानही संकुचित नव्हता. यामुळे तो प्रॉटेस्टंट व कॅथॉलिक या दोन्ही पंथांच्या लोकांना समानतेने वागवी. डब्लिन युनिव्हर्सिटींत कॅथॉलिक लोकांना घ्यावे असे त्याचे मत होते.<br>{{gap}}येथे आपले काम करीत असतां बार्क्लेचें लक्ष्य सामान्य लोकांच्या स्थितीकडे लागले व आयरिश लोकांची किती दैन्यावस्था आहे हे त्याच्या ध्यानांत येऊन मोठ्या लोकांचे लक्ष्य या गोष्टीकडे वेधावे म्हणून त्याने प्रश्नांच्या रूपाने आपले विचार प्रदर्शित केले. या प्रश्नांचे तीन भाग बार्क्लेने प्रसिद्ध केले. या तिन्ही भागांत सामाजिक व अर्थशास्त्रविषयक किती तरी तत्वे न कळत ग्रथित झाली आहेत. ह्यूम किंवा अर्थशास्त्राचा जनक ॲडॅम स्मिथ याच्यापूर्वी सुमारे ४० वर्षे हा ग्रंथ लिहिला गेला. त्या मानाने त्याची महती विशेषच आहे. ज्या ज्या विषयाकडे बार्क्ले आपले लक्ष घाली, त्या त्या विषयांत तो काही तरी नव्या कल्पना काढीत असे. साध्या व सुंदर भाषेत आपले विचार प्रदर्शित करण्याची विलक्षण हातोटी त्याला साधलेली होती.<br>{{gap}}वर सांगितलेच आहे की, क्लॉयॉनीचा बिशप या नात्याने बार्क्लेने १८ वर्षे त्या ठिकाणी काढली. या इतक्या अवकाशांत तो एकदांच बाहेर गेला होता व तो डबलीन येथे पार्लमेंट चालू असतांना होय.<br>{{gap}}बार्क्ले क्लॉयॉनी येथे कायमचा येऊन राहिल्यावर १७३९ मध्ये आय-<noinclude>{{center|६६}}</noinclude> a3hvgnztyvjxgl319w1l8ddj95cilfi पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७३ 104 110322 230253 229925 2026-05-21T11:33:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230253 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>र्लंडांत मोठा दुष्काळ पडला व दुष्काळाची सोबतीण सांथ हीहि सुरू झाली. यामुळे हजारों लोक मरण पावले. या दुर्धर प्रसंगाने बार्क्लेचे लक्ष्य रोगाला एकादें औषध शोधून काढण्याकडे लागले. रोड बेटांत असतांना तेथील रहिवाशांकडून त्याने डामर या पदार्थाच्या विलक्षण गुणाबद्दल ऐकलें होते. त्यासंबंधी त्याने आतां प्रयोग चालविले व डामराच्या पाण्यापासून पुष्कळ ठिकाणी फार गुण येतो, असे त्याला दिसून आले. बार्क्लेच्या नेहमींच्या उत्साही स्वभावाप्रमाणे हे औषध सर्वरोगपरिहारक आहे, अशी त्याची समजूत होऊन डामराच्या पाण्याच्या रामबाणपणाबद्दल त्याने लेख लिहिले व त्याचा जनसमूहावर विलक्षण परिणाम झाला. जिकडे तिकडे डामराचे पाणी तयार करण्याचे कारखाने निघाले! या वेळी शास्त्रीय वैद्याबरोबर बार्क्लेला दोन हात करावे लागले व ते त्याने केलेहि. डामराच्या या विलक्षण शक्ती संबंधी बार्क्लेच्या डोक्यात विचार घोळू लागले. या काळी त्याचे वाचन प्लेटो व नीओप्लॅटनिझम यांबदल चालू होते. यामुळे या दृश्य जगाच्या मुळाशी कांहीं एक अदृश्य तत्व आहे अशी त्याची समजूत झाली व कशा तरी तऱ्हेनें डामरांत तें अदृश्य तत्व येत असावे, व म्हणूनच डामराच्या अंगीं सर्वरोगपरिहारक अशी विलक्षण शक्ति उत्पन्न होत असावी असे बार्क्लेच्या मनाने घेतले. याप्रमाणे वैद्यशास्त्र व तत्वज्ञान यांचा मिलाफ त्याच्या मनांत अवतीर्ण होऊन याच मनःस्थितीत त्याने 'सांखळी' म्हणून एक ग्रंथ प्रसिद्ध केला. यांतील डामरासंबंधाचा भाग अर्थातच क्षणिक महत्त्वाचा होता. डामरासंबंधी बार्क्लेचे विचार अर्वाचीन वैद्यशास्त्राला संमत नाहीत. तरी पण डामर आणि त्याचाच पर्याय क्रिआसोट ही दोन औषधे अर्वाचीन वैद्यकांत कायमची आली, हा बार्क्लेच्या लेखांचा आणि प्रयोगांचा परिणाम होय, यांत शंका नाही! परंतु 'सांखळी' या ग्रंथांतील तात्विक भाग हा कायमच्या महत्वाचा आहे व या भागावरून बार्क्लेच्या तात्विक विचारांची वाढ सारखी होत होती असे दिसते. बार्क्लेच्या कॉलेजांतील तरुणपणच्या दिवसांत त्याचा विशेष ओढा जड द्रव्याचा अभाव सिद्ध करण्याकडे होता. या काळांत त्याचा<noinclude>{{center|६७}}</noinclude> ndms9bufkrfy48u51ezazd3r4antjpa पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७४ 104 110323 230254 229926 2026-05-21T11:37:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230254 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>प्रत्यक्षावर जास्त जोर होता; व प्रत्यक्ष संवेदनाच्या पलीकडे ज्ञेय असे काही नाही, असे त्याने प्रतिपादन केले. त्याच्या मध्यआयुष्यात त्याचा भर नास्तिक लोकांविरुद्ध होता व त्याच्या उतारवयांत त्याची मते प्लेटोच्या सारखी होत चालली होती. दृश्य संवेदनाच्या किंवा इंद्रियांनी गोचर होणाऱ्या दृश्य जगाच्या पाठीमागे चिन्मय असें एक तत्व आहे व या चिन्मय तत्वाचा आपले दृश्य जग हा विकास आहे, असें बार्क्लेला भासू लागले होते, आणि हाच तत्वविचार 'सांखळी' या ग्रंथांत प्रमुखत्वाने आलेला आहे.<br>{{gap}}बार्क्लेचा संसार मोठ्या सुखाचा झाला. त्याला बायको त्याच्या अनुरूप मिळाली होती. त्याला दोन मुलगे, एक मुलगी (रोड बेटांत अगदी लहानपणी वारलेली मुलगी सोडून) इतकीच अपत्ये झाली. मात्र त्याच्या उतारवयांत त्याचा एक तरुण मुलगा वारला. प्रसिद्ध मुत्सद्दी बर्कला जसें पुत्रवियोगाचे दुःख झालें, तशीच बार्क्लेची स्थिति झाली. एका पत्रांत बार्क्लेने आपल्या या पुत्रनिधनाचा उल्लेख केलेला आहे. ते पत्र मनाला चटका लावण्यासारखे आहे:-<br>{{gap}}"खाजगी व दरबारी व्यवसाय, व ज्याला लोकांत सुख मानतात, या सर्वांपासून मी अलिप्त होतो. माझ्या नजरेखाली शिकलेला माझा एक लहानसा मित्र होता. त्याचे चित्रलेखन मला आनंद देत असे, त्याचे गायन मला मोहून टाकी, आणि त्याचा तरतरीत व आनंदी स्वभाव माझी नेहमी करमणूक करी. देवाने माझा मित्र हिरावून नेला! देवाची मर्जी! त्याचे गुण व त्याचे स्वरूप, त्याचा साधेपणा, त्याची धर्मनिष्ठा व विशेषतः त्याची पितृभक्ति यांनी माझ्यावर फार छाप ठेवली होती. मला तो प्रिय होता, इतकेच नव्हे, त्याचा मला गर्व वाटे! या जगांतील वस्तूंवर ठेवू नये इतका मी त्याच्यावर आपला जीव ठेवला होता."<br>{{gap}}आतां बार्क्लेच्या आयुष्यातील एकच प्रसंगाची हकीकत सांगावयाचा राहिली. बार्क्लेने आपल्या मुलाला ऑक्सफर्ड विद्यालयांत घातले व आपणही आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस त्याच विद्यापीठाच्या ठिकाणी घाल-<noinclude>{{center|६८}}</noinclude> hre567naysuyr6ov02hl7ufa3gz7855 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७५ 104 110324 230255 229927 2026-05-21T11:39:31Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230255 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>वावे, असे त्याच्या मनाने घेतले व आपल्या निश्चयी व उत्साही स्वभावानुरूप कसल्याही अडचणींना न जुमानतां बार्क्लेने आपला निश्चय पार पाडला. आपला बिशपचा हुद्दा कायम ठेवून त्याला नियमाप्रमाणे ऑक्सफर्डला जातां येईना, तेव्हां त्याने ताबडतोब त्या हुद्याचा राजिनामा दिला. पण जॉर्ज राजाने त्याच्या वयाकडे व विद्वत्तेकडे पाहून त्याच्याकरतां नेहमींच्या नियमाला अपवाद करून बार्क्लेला बिशपच्या हुद्याचा राजिनामा न देतां ऑक्सफर्डमध्ये राहण्याची परवानगी दिली. पण ऑक्सफर्डला येऊन बार्क्लेला फार दिवस झाले नाहीत, तोंच तो एके दिवशी आपल्या कुटुंबामध्ये मुलाबाळांसमवेत बोलत बसला असतां एकाएकी १७५३ मध्ये मरण पावला! अशा तऱ्हेचे सुखाचे मरण येणे फार थोड्यांच्या नशिबी असते.<br>{{gap}}बार्क्लेच्या चरित्रापासून त्याचा निश्चयी, उत्साही, सरळ स्वभाव उत्कृष्ट तऱ्हेने दिसून येतो. त्याचे तात्विक विचार आपल्या इकडल्या हरिदासाप्रमाणे प्रपंचापासून अलग राहिलेले नव्हते, तर त्या विचारांचा पूर्ण अंमल त्याच्या वर्तनावर झालेला होता. खऱ्या तत्त्वज्ञान्याप्रमाणे त्याची वृत्ति बनलेली होती. तो मान, पैसा किंवा कीर्ति यांकरितां हपापलेला नव्हता. आपल्या विचारांशी आचाराचे तादात्म्य करणारी माणसें विरळा म्हणून तुकाराममहाराजांनी अशी माणसें वंदनीय आहेत असे यथार्थ उद्गार काढलेले आहेत. त्याच कोटीपैकी बार्क्ले हा तत्वज्ञानी होता. <br><br>{{rule|7em}}{{nop}}<noinclude>{{center|६९}}</noinclude> ovrac71frkgq7sb0zvqpf0nyfol0hts पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७६ 104 110325 230256 229928 2026-05-21T11:48:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 230256 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|'''(२)'''}} {{center|{{xx-larger|'''बार्क्लेचे तत्त्वज्ञान.'''}}}} {{rule|10em}} {{gap}}येथपर्यंत बार्क्लेचे संक्षिप्त चरित्र व कालानुक्रमाने त्याच्या ग्रंथांची माहिती दिली. बार्क्लेच्या चरित्राकडे पाहिले म्हणजे असे दिसून येते की, ज्याप्रमाणे केव्हां केव्हां कवि हे स्वयंस्फूर्तीने- अभ्यासाने- अनुकरणाने- परिश्रमाने नव्हें- कवि बनतात त्याप्रमाणे बार्क्ले हा स्वयंस्फूर्तीने तत्वज्ञानी बनलेला होता. कॉलेजापासून त्याचे तत्त्वज्ञानविषयक विचार चालू झाले व ते आमरणांत चालू राहिले. यामुळेच त्याचे तत्त्वज्ञानविषयक विचार ठाम किंवा स्थिर न राहता ते कांहींसे बदलत गेले व त्या विचारांचे सिंहावलोकन करणारास त्या विचारांची प्रगति होत गेलेली आहे असें दिसते. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानविषयक विचारामध्ये जणू काही अर्वाचीन युरोपच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाचे स्वरूप अल्प प्रमाणांत दिसून येते. म्हणूनच बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाच्या तीन पायऱ्या पडतात असें बार्क्लेच्या चरित्रकारांनी म्हटले आहे. बार्क्लेच्या आयुष्यातील तत्त्वज्ञानविषयक विचारांत एकप्रकारची एकसूत्रता असून त्याच्या विचारांची सारखी परिणती होत गेलेली आहे असे दृष्टीस पडते. बार्क्लेच्या तत्त्वज्ञानाचें सामान्य धोरण त्या काळी बोकाळत चाललेल्या जडवादाविरुद्ध व नास्तिक्याविरुद्ध होते. जगाचे आदि कारण जड पंचमहाभूते नसून चिन्मय असा परमेश्वर आहे हे त्याने युक्तीच्या साहाय्याने प्रतिपादन केले व हे करण्याकरितां 'मूले कुठारः' या न्यायाने त्याने असे दाखविण्याचा प्रयत्न केला की ज्याला जड द्रव्य किंवा पंचमहाभूते म्हणतात तीच मुळी चित्तत्वाची संवेदनात्मक स्वरूपे होत. आतां बार्क्लेच्या तत्वज्ञानविषयक विचारांचे क्रमाने विवेचन करूं.{{nop}}<noinclude>{{center|७०}}</noinclude> fmnr9v44azara9es9y6107u19efn5vk सदस्य चर्चा:Renukare 3 110377 230245 2026-05-21T05:43:48Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 230245 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Renukare}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ११:१३, २१ मे २०२६ (IST) cuyf31y9a6ub74ls3y201ieasjun77o सदस्य चर्चा:DGJ1954 3 110378 230246 2026-05-21T08:57:21Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 230246 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=DGJ1954}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १४:२७, २१ मे २०२६ (IST) 0hies4exwb5tpzwyo6v16gv236ihl73