विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.3
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:तीन तत्त्वज्ञानी.pdf
106
68408
230266
230240
2026-05-21T12:51:24Z
कल्पनाशक्ती
3813
230266
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=तीन तत्त्वज्ञानी
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=केशव रावजी गोंधळेकर
|Address=पुणे
|Year=1921
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="प्रस्तावना" 6 ="अनुक्रमणिका" 7="साक्रेटिस" 63="जॉर्ज बार्क्ले" 86="कँट"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
3pje7p74nyhjw4t17u4qcm9nfpgy1vr
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६२
104
85716
230267
181882
2026-05-22T06:12:24Z
JayashreeVI
4058
230267
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|५७}}
{{rule}}</noinclude>त्यांत रामदासांनी ध्यान, परब्रह्म व माया या तिहींचें स्वरूपवर्णन दिलें आहे. त्यांत मायेचें स्वरूप वर्णन करतांना खालील ओवी आहे.
{{block center|<poem>मुळीं बालविधवा नारी । तिचे नांव जन्मसावित्री ।
कुबेर हिंडे घरोघरीं । तैसी माया ॥</poem>}}
{{gap}}पंधराव्या दशकांत सामान्यतः रामदास आपल्या वेदांती तत्वाचेंच पुनः विवरण करण्यास लागले आहेत असे दिसतें. मात्र पहिले तीन समास व सहावा समास यांमध्यें चातुर्यलक्षण, निस्पृहलक्षण व आत्मनिरीक्षण या नांवाखालीं व्यावहारिक उपदेश केला आहे व तो संबंध चवदाव्या समासाप्रमाणे आपल्या रामदासी पंथांतील लोकांना केल्यासारखा दिसतो. त्यांत पुष्कळ गोष्टी गुप्तपणे कराव्या व केल्याचा लोकांना सुगावा लागूं देऊं नये व राजकारण करावें, लोकांची मनें राजी राखावीं वगैरे प्रकारचे उद्गार आले आहेत व बहुधा अशासारख्या उद्गारांवरून रामदास मोठे मुत्सद्दी असले पाहिजेत, त्यांच्याच स्फूर्तीने सर्व महाराष्ट्रांत राजकारण सुरु झाले असले पाहिजे; रामदासी पंथ म्हणजे एक राजकीय पंथ असला पाहिजे वगैरे कल्पना निघाल्या असाव्यात असे
वाटतें. पण या अपवादात्मक व संशयात्मक उद्गारांवरून इतकीं खोल खोल अनुमानें काढणें रास्त आहे किंवा नाहीं हें ठरविणे कठीण आहे. कांहीं उद्गारांवरून तर त्यांना हें राजकारण पसंत नसावें की काय असाही भास होतो. या चार समासांतले मुद्दयाचे व मासलेवाईक उतारे एकत्र येथें देतो. त्यांवरून निघणा-या अनुमानांचे विवेचन दासबोधाच्या सारसमाप्तीनंतर करावयाचें आहे.
{{block center|<poem>या कारणें मुख्यमुख्य । तयासी करावें सख्य |
येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥
धूर्तासि धूर्ताच आवडे । धूर्त धूर्तीच पवाडे ।
उगीच हिंडती वेडे । कार्येविण ।।
धूर्तासि धूर्तपण कळलें । तेणें मानसीं मन मिळालें ।
परि हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्व ॥
समर्थाचें राखितां मन । तेथें येती उदंड जन ।</poem>}}<noinclude></noinclude>
0g6ofk76smmzqpltfnba5aoxmzbwt4u
230268
230267
2026-05-22T06:12:49Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230268
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|५७}}
{{rule}}</noinclude>त्यांत रामदासांनी ध्यान, परब्रह्म व माया या तिहींचें स्वरूपवर्णन दिलें आहे. त्यांत मायेचें स्वरूप वर्णन करतांना खालील ओवी आहे.
{{block center|<poem>मुळीं बालविधवा नारी । तिचे नांव जन्मसावित्री ।
कुबेर हिंडे घरोघरीं । तैसी माया ॥</poem>}}
{{gap}}पंधराव्या दशकांत सामान्यतः रामदास आपल्या वेदांती तत्वाचेंच पुनः विवरण करण्यास लागले आहेत असे दिसतें. मात्र पहिले तीन समास व सहावा समास यांमध्यें चातुर्यलक्षण, निस्पृहलक्षण व आत्मनिरीक्षण या नांवाखालीं व्यावहारिक उपदेश केला आहे व तो संबंध चवदाव्या समासाप्रमाणे आपल्या रामदासी पंथांतील लोकांना केल्यासारखा दिसतो. त्यांत पुष्कळ गोष्टी गुप्तपणे कराव्या व केल्याचा लोकांना सुगावा लागूं देऊं नये व राजकारण करावें, लोकांची मनें राजी राखावीं वगैरे प्रकारचे उद्गार आले आहेत व बहुधा अशासारख्या उद्गारांवरून रामदास मोठे मुत्सद्दी असले पाहिजेत, त्यांच्याच स्फूर्तीने सर्व महाराष्ट्रांत राजकारण सुरु झाले असले पाहिजे; रामदासी पंथ म्हणजे एक राजकीय पंथ असला पाहिजे वगैरे कल्पना निघाल्या असाव्यात असे
वाटतें. पण या अपवादात्मक व संशयात्मक उद्गारांवरून इतकीं खोल खोल अनुमानें काढणें रास्त आहे किंवा नाहीं हें ठरविणे कठीण आहे. कांहीं उद्गारांवरून तर त्यांना हें राजकारण पसंत नसावें की काय असाही भास होतो. या चार समासांतले मुद्दयाचे व मासलेवाईक उतारे एकत्र येथें देतो. त्यांवरून निघणा-या अनुमानांचे विवेचन दासबोधाच्या सारसमाप्तीनंतर करावयाचें आहे.
{{block center|<poem>या कारणें मुख्यमुख्य । तयासी करावें सख्य |
येणेंकरितां असंख्य । बाजारी मिळती ॥
धूर्तासि धूर्ताच आवडे । धूर्त धूर्तीच पवाडे ।
उगीच हिंडती वेडे । कार्येविण ।।
धूर्तासि धूर्तपण कळलें । तेणें मानसीं मन मिळालें ।
परि हें गुप्तरूपें केलें । पाहिजे सर्व ॥
समर्थाचें राखितां मन । तेथें येती उदंड जन ।</poem>}}<noinclude></noinclude>
6igkz8owe9p09xjio9aguafay06b5xz
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/६३
104
85717
230269
181883
2026-05-22T06:29:41Z
JayashreeVI
4058
230269
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|५८| सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥
वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूंच नये ॥
जितुक्या मूर्ति तितुक्या प्रकृती। सारिख्याच नसती आदिअंती ।
नेमचि नाहीं पाहावें किती । काय म्हणोनि ॥
कित्येक म्लेच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांत आटले ।
देशभाषेनें रोधिले | कितीएक ||
महाराष्ट्र देश थोडा उरला । राजकारणें लोक रोधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ||
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले ।
रात्रंदिवस करू लागले । युद्धचर्चा |
उदम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोट धंदा लागला | निरंतर ||
कुग्रामें अथवा नगरें । पाहावी घरांची घरें ।
भिक्षामिषे लहान थोरें । परीक्षून सोडावीं ॥</poem>}}
{{gap}}बाकीच्या समासांत नेहमीप्रमाणे वेदांत मतांचा अनुवाद केलेला आहे. चवथ्या समासांत सर्व जड वस्तु पृथ्वीपासून झाल्या आहेत व त्यांचा नाश झाल्यावर त्यांचे पृथ्वीतच रूपांतर होते; पृथ्वी पाण्यापासून झाली व
तिचा नाश म्हणजे पाण्यांत तिचें रूपांतर होते; त्याचप्रमाणें इतर भूतांचीं अवस्था आहे व या सर्वांचें मूळाशी शाश्वत ब्रह्म आहे असे प्रतिपादन केले आहे. पांचव्या समासांत सर्व चंचळ व भिन्न वस्तूंच्या मूळाशी देव
आहे असे सांगितले आहे.
{{gap}}सात, आठ, नऊ व दहा या समासांत निरनिराळ्या रूपकांनी मायेपासून, अगदी सूक्ष्मजन्तूपासून तो थेट मनुष्यापर्यंत सर्व प्राणिमात्र पंचभूतांच्या व त्रिगुणांच्या व्यापारानें कसें झाले आहे व मायेपूर्वी परब्रह्म आहे तें ओळखून ज्ञानानें उपासना व भजन करून आपल्या आयुष्याचें सार्थक करावें असे सांगून दशक संपविला आहे.
{{center|2cm}}<noinclude></noinclude>
a118u7nr0t097ncb68lpjqyvjtrkh8f
230270
230269
2026-05-22T06:32:20Z
JayashreeVI
4058
230270
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|५८| सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥
वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूंच नये ॥
जितुक्या मूर्ति तितुक्या प्रकृती। सारिख्याच नसती आदिअंती ।
नेमचि नाहीं पाहावें किती । काय म्हणोनि ॥
कित्येक म्लेच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांत आटले ।
देशभाषेनें रोधिले | कितीएक ||
महाराष्ट्र देश थोडा उरला । राजकारणें लोक रोधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ||
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले ।
रात्रंदिवस करू लागले । युद्धचर्चा |
उदम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोट धंदा लागला | निरंतर ||
कुग्रामें अथवा नगरें । पाहावी घरांची घरें ।
भिक्षामिषे लहान थोरें । परीक्षून सोडावीं ॥</poem>}}
{{gap}}बाकीच्या समासांत नेहमीप्रमाणे वेदांत मतांचा अनुवाद केलेला आहे. चवथ्या समासांत सर्व जड वस्तु पृथ्वीपासून झाल्या आहेत व त्यांचा नाश झाल्यावर त्यांचे पृथ्वीतच रूपांतर होते; पृथ्वी पाण्यापासून झाली व
तिचा नाश म्हणजे पाण्यांत तिचें रूपांतर होते; त्याचप्रमाणें इतर भूतांचीं अवस्था आहे व या सर्वांचें मूळाशी शाश्वत ब्रह्म आहे असे प्रतिपादन केले आहे. पांचव्या समासांत सर्व चंचळ व भिन्न वस्तूंच्या मूळाशी देव
आहे असे सांगितले आहे.
{{gap}}सात, आठ, नऊ व दहा या समासांत निरनिराळ्या रूपकांनी मायेपासून, अगदी सूक्ष्मजन्तूपासून तो थेट मनुष्यापर्यंत सर्व प्राणिमात्र पंचभूतांच्या व त्रिगुणांच्या व्यापारानें कसें झाले आहे व मायेपूर्वी परब्रह्म आहे तें ओळखून ज्ञानानें उपासना व भजन करून आपल्या आयुष्याचें सार्थक करावें असे सांगून दशक संपविला आहे.
{{rule|center|2cm}}<noinclude></noinclude>
k9dya4rnnsvgk7zrt3k8belyum5fdhu
230271
230270
2026-05-22T06:33:46Z
JayashreeVI
4058
230271
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|५८| सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥
वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूंच नये ॥
जितुक्या मूर्ति तितुक्या प्रकृती। सारिख्याच नसती आदिअंती ।
नेमचि नाहीं पाहावें किती । काय म्हणोनि ॥
कित्येक म्लेच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांत आटले ।
देशभाषेनें रोधिले | कितीएक ||
महाराष्ट्र देश थोडा उरला । राजकारणें लोक रोधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ||
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले ।
रात्रंदिवस करू लागले । युद्धचर्चा |
उदम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोट धंदा लागला | निरंतर ||
कुग्रामें अथवा नगरें । पाहावी घरांची घरें ।
भिक्षामिषे लहान थोरें । परीक्षून सोडावीं ॥</poem>}}
{{gap}}बाकीच्या समासांत नेहमीप्रमाणे वेदांत मतांचा अनुवाद केलेला आहे. चवथ्या समासांत सर्व जड वस्तु पृथ्वीपासून झाल्या आहेत व त्यांचा नाश झाल्यावर त्यांचे पृथ्वीतच रूपांतर होते; पृथ्वी पाण्यापासून झाली व
तिचा नाश म्हणजे पाण्यांत तिचें रूपांतर होते; त्याचप्रमाणें इतर भूतांचीं अवस्था आहे व या सर्वांचें मूळाशी शाश्वत ब्रह्म आहे असे प्रतिपादन केले आहे. पांचव्या समासांत सर्व चंचळ व भिन्न वस्तूंच्या मूळाशी देव
आहे असे सांगितले आहे.
{{gap}}सात, आठ, नऊ व दहा या समासांत निरनिराळ्या रूपकांनी मायेपासून, अगदी सूक्ष्मजन्तूपासून तो थेट मनुष्यापर्यंत सर्व प्राणिमात्र पंचभूतांच्या व त्रिगुणांच्या व्यापारानें कसें झाले आहे व मायेपूर्वी परब्रह्म आहे तें ओळखून ज्ञानानें उपासना व भजन करून आपल्या आयुष्याचें सार्थक करावें असे सांगून दशक संपविला आहे.
{{dhr|2cm}}<noinclude></noinclude>
5nk1myzw0rz1a89cwvdusa4sfh6dnik
230272
230271
2026-05-22T06:36:09Z
JayashreeVI
4058
230272
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|५८| सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥
वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूंच नये ॥
जितुक्या मूर्ति तितुक्या प्रकृती। सारिख्याच नसती आदिअंती ।
नेमचि नाहीं पाहावें किती । काय म्हणोनि ॥
कित्येक म्लेच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांत आटले ।
देशभाषेनें रोधिले | कितीएक ||
महाराष्ट्र देश थोडा उरला । राजकारणें लोक रोधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ||
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले ।
रात्रंदिवस करू लागले । युद्धचर्चा |
उदम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोट धंदा लागला | निरंतर ||
कुग्रामें अथवा नगरें । पाहावी घरांची घरें ।
भिक्षामिषे लहान थोरें । परीक्षून सोडावीं ॥</poem>}}
{{gap}}बाकीच्या समासांत नेहमीप्रमाणे वेदांत मतांचा अनुवाद केलेला आहे. चवथ्या समासांत सर्व जड वस्तु पृथ्वीपासून झाल्या आहेत व त्यांचा नाश झाल्यावर त्यांचे पृथ्वीतच रूपांतर होते; पृथ्वी पाण्यापासून झाली व
तिचा नाश म्हणजे पाण्यांत तिचें रूपांतर होते; त्याचप्रमाणें इतर भूतांचीं अवस्था आहे व या सर्वांचें मूळाशी शाश्वत ब्रह्म आहे असे प्रतिपादन केले आहे. पांचव्या समासांत सर्व चंचळ व भिन्न वस्तूंच्या मूळाशी देव
आहे असे सांगितले आहे.
{{gap}}सात, आठ, नऊ व दहा या समासांत निरनिराळ्या रूपकांनी मायेपासून, अगदी सूक्ष्मजन्तूपासून तो थेट मनुष्यापर्यंत सर्व प्राणिमात्र पंचभूतांच्या व त्रिगुणांच्या व्यापारानें कसें झाले आहे व मायेपूर्वी परब्रह्म आहे तें ओळखून ज्ञानानें उपासना व भजन करून आपल्या आयुष्याचें सार्थक करावें असे सांगून दशक संपविला आहे.
{{rule||4cm}}<noinclude></noinclude>
59u2iwq3fojnf9pfthuhuj9zab9axus
230273
230272
2026-05-22T06:37:22Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230273
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|५८| सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{block center|<poem>जन आणि सज्जन । आर्जव करिती ॥
वेष धरावा बावळा । अंतरी असाव्या नाना कळा ।
सगट लोकांचा जिव्हाळा । मोडूंच नये ॥
जितुक्या मूर्ति तितुक्या प्रकृती। सारिख्याच नसती आदिअंती ।
नेमचि नाहीं पाहावें किती । काय म्हणोनि ॥
कित्येक म्लेच्छ होऊन गेले । कितेक फिरंगणांत आटले ।
देशभाषेनें रोधिले | कितीएक ||
महाराष्ट्र देश थोडा उरला । राजकारणें लोक रोधिला ।
अवकाश नाहीं जेवायाला । उदंड कामें ||
कित्येक युद्धप्रसंगी गुंतले । तेणें गुणें उन्मत्त झाले ।
रात्रंदिवस करू लागले । युद्धचर्चा |
उदम्यास व्यासंग लागला । अवकाश नाहींसा झाला ।
अवघा पोट धंदा लागला | निरंतर ||
कुग्रामें अथवा नगरें । पाहावी घरांची घरें ।
भिक्षामिषे लहान थोरें । परीक्षून सोडावीं ॥</poem>}}
{{gap}}बाकीच्या समासांत नेहमीप्रमाणे वेदांत मतांचा अनुवाद केलेला आहे. चवथ्या समासांत सर्व जड वस्तु पृथ्वीपासून झाल्या आहेत व त्यांचा नाश झाल्यावर त्यांचे पृथ्वीतच रूपांतर होते; पृथ्वी पाण्यापासून झाली व
तिचा नाश म्हणजे पाण्यांत तिचें रूपांतर होते; त्याचप्रमाणें इतर भूतांचीं अवस्था आहे व या सर्वांचें मूळाशी शाश्वत ब्रह्म आहे असे प्रतिपादन केले आहे. पांचव्या समासांत सर्व चंचळ व भिन्न वस्तूंच्या मूळाशी देव
आहे असे सांगितले आहे.
{{gap}}सात, आठ, नऊ व दहा या समासांत निरनिराळ्या रूपकांनी मायेपासून, अगदी सूक्ष्मजन्तूपासून तो थेट मनुष्यापर्यंत सर्व प्राणिमात्र पंचभूतांच्या व त्रिगुणांच्या व्यापारानें कसें झाले आहे व मायेपूर्वी परब्रह्म आहे तें ओळखून ज्ञानानें उपासना व भजन करून आपल्या आयुष्याचें सार्थक करावें असे सांगून दशक संपविला आहे.
{{center|________}}<noinclude></noinclude>
pfkjga1vns9p1vnlpd7798mqb46qyct
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७७
104
110326
230257
229929
2026-05-21T12:00:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230257
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>{{gap}}बार्क्लेचा पहिला तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ म्हणजे 'दृष्टीची नवी मीमांसा' हा होय. या ग्रंथाचा विषय बाह्यतः तत्त्वज्ञानाचा दिसत नाही; पण या विषयाचे पर्यवसान तात्त्विक आहे असे बार्क्लेने दाखविले आहे. आपल्या पांच ज्ञानेंद्रियांमध्ये आपण दृष्टीला किंवा डोळ्यांना जास्त महत्व देतो. कोणत्याही बाह्य गोष्टीच्या किंवा जड द्रव्याच्या अस्तित्वाचे अत्यंत भरंवशाचे प्रमाण म्हणजे अवलोकनाचे होय असे आपण म्हणतो, 'चक्षुर्वैसत्यं' या म्हणीवरून सत्यशोधनांत डोळ्याचें केवढे महत्त्व आहे हे समजते. 'प्रत्यक्ष' हा शब्दही तेच दाखवितो जडवाद्यांचे प्रमाणसर्वस्व म्हणजे प्रत्यक्ष होय. जेवढे डोळ्याने दिसते तेवढेच सत्य असें चार्वाकासारखे तत्त्वज्ञानी मानतात. असें या प्रत्यक्ष प्रमाणाचे महत्त्व असल्यामुळे बार्क्लेने या प्रमाणाचे पृथक्करण आपल्या ग्रंथांत केले आहे.<br>{{gap}}वस्तूंचा आकार, त्यांचे रंगरूप, त्यांची लांबी रुंदी खोली- सारांश वस्तूंचे मुख्य मुख्य गूण- विशेषतः त्या वस्तूंना जडत्व देणारे गुण- तसेंच वस्तूंमधले अंतर म्हणजे वस्तूंचे दूरपण किंवा नजीकपण हे सर्व गूण आपण आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहतो असें सामान्यतः समजले जाते. पण बार्क्लेने असें प्रतिपादन केले की, हा आपला समज चुकीचा आहे. आपण खरोखरी हे सर्व विविध गुण प्रत्यक्ष पहात नाही, तर प्रत्यक्ष पाहिलेल्या गुणांवरून आपण इतर गुणांबद्दल अनुमान-अंदाज करतो.<br>{{gap}}दृष्टीचा खरा विषय रंग आहे. पदार्थापासून निघणारे किरण आपल्या डोळ्यांच्या बुबुळांवर पडतात व आपल्या डोळ्यासमोर कमी अधिक स्पष्ट अशी रंगाची आकृति उभी राहते. आपल्या बुबुळांवर पदार्थाच्या किरणांची टाके पडतात. तो किरण दुरून आला किंवा जवळून आला हे किरणाच्या कमी अधिक लांबीवरून कळणे शक्य नाही. कारण किरणांची लांबी आपल्याला दिसत नाही. म्हणून आपल्या डोळ्यांना अंतर-पदार्थाचा नजिकपणा किंवा दूरपणा हा प्रत्यक्ष दिसत नाही. दूरच्या पदार्थाकडून आलेल्या किरणांनी पाडलेली आकृति लहान व अंधुक असते, तर जवळच्या पदार्था-<noinclude>{{center|७१}}</noinclude>
s5uscwaxsv13fp07npqztmp2q4j8naz
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७८
104
110327
230258
229930
2026-05-21T12:06:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230258
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>कडून आलेल्या किरणांनी पाडलेली आकृति अधिक मोठी व अधिक स्पष्ट असते इतकेंच, पदार्थाचा दूरपणा किंवा नजीकपणा हा आपल्याला खरोखरी गतीने प्रत्यक्ष कळतो. ज्या वस्तूकडे जाण्याला आपल्याला जास्त चालावे लागते ती वस्तु दूर आहे असे आपण समजतो व ज्या वस्तूकडे जाण्याला थोडे चालावे लागते ती जवळ आहे असे आपण म्हणतों. वस्तु दूर असतांना तिची आपल्या डोळ्यावर पडणारी आकृति लहान व अंधुक अशी आपण पाहतों व जसजसे आपण वस्तूच्या जवळ जवळ जातो तसतशी ही आकृति मोठी व स्पष्ट होत आहे अस आपल्याला दिसून येते. तेव्हां आकृतीचा कमीअधिक अंधुकपणा व लहानमोठेपणा या पदार्थाच्या कमीअधिक दुरपणाच्या अंतराच्या खुणा आपल्या अनुभवावरून आपण मनांत बनवितों व वस्तूची डोळ्यावर पडलेली आकृति स्पष्ट व मोठी असल्यास वस्तु जवळ आहे असे न कळत आपण अनुमान करतो. खरोखरी डोळ्यांनी आपल्याला पदार्थाचे अंतर किंवा खाली दिसत नाही. हळुहळ अनुभवाने आपण बिनचूक अनुमान करू शकतो. ही गोष्ट एका दाखल्याने स्पष्ट करता येईल. एखादा मनुष्य जन्मतः आंधळा आहे असे समजा, त्याला वस्तूंचे ज्ञान स्पर्शन्द्रियान व हालण्याचालण्याने किंवा गतीनेच फक्त झालेले असते. म्हणजे त्याला वस्तूची लांबीरुंदीखोली वस्तूचा दुरपणा वगैरे सर्व गोष्टी स्पर्शाने व गतीने प्रत्यक्ष झालेल्या असतात, पण त्याला वस्तूच्या रंगाचे ज्ञान नसते. अशा आंधळ्या मनुष्याला डोळे आले व त्याने एका आकाराचा व एका रंगाचा चेंडू व त्याच आकाराचे व त्याच रंगाचे चेंडूचे चित्र एकदम व सारख्या अंतरावरून पाहिले तर त्याला चेंडू कोणचा व चित्र कोणते हे ओळखत येणार नाही. कारण डोळ्यावर पडणाऱ्या दोन्ही रंगांच्या आकृतामध्ये सूक्ष्म भेद असेल खरा; पण तो भेद त्या डोळस झालेल्या आंधळ्याला कळणार नाही. त्या दिसत्या आकृतीकडे चालत जाऊन त्या दोन्ही वस्तूंना स्पर्श करून जेव्हां तो डोळस मनुष्य पाहील तेव्हांच त्याला चित्र व चेंडू यातला फरक कळेल व मग पुनः दुरून डोळ्याने पाहून त्याला चित्राच्या व<noinclude>{{center|७२}}</noinclude>
qq0tqb9l3pn2s2h3ph092z3nylyi5ac
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/७९
104
110328
230259
229931
2026-05-21T12:12:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230259
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>चेंडूच्या डोळ्यांवर पडलेल्या आकृतीतील सूक्ष्म भेद ध्यानांत येईल. म्हणजे डोळ्यांवर पडलेल्या आकृतीच्या कमीअधिक स्पष्टपणावरून तो स्पर्शेद्रियाने होणाऱ्या वस्तूच्या खऱ्या आकाराचे व स्वरूपाचे बिनचूक अनुमान करूं लागेल. आपल्या डोळ्यांना प्रत्यक्ष अंतर दिसत नाही, तर संवयीने व अनुभवाने आपण अंतर अजमावतों, याचे अर्वाचीन काळचे उदाहरण म्हणजे एकामागे एक असलेले सिग्नलचे दिवे होत. रात्रीच्या वेळी हे दिवे एकाच अंतरावर असून समोरासमोर असलेल्या दोन दिव्यांप्रमाणे नवख्या माणसाला भासतात. पण रात्रीच्या प्रहरी काम करणाऱ्या स्टेशनवरच्या पोर्टरला दिव्यांच्या उजेडाच्या कमीअधिक प्रमाणावरून व लहानमोठ्या आकारावरून दूरच्या अंतराचा दिवा कोणता व जवळचा कोणता हे बिनचूक सांगतां येते.<br>{{gap}}अशा व अशाच तऱ्हेच्या दुसऱ्या प्रमाणांवरून बार्क्लेने असे प्रतिपादन केले की, आपण जें वस्तूचे पाहणे म्हणतो ते खरोखरी पाहणे नसून अजमावणे असते. म्हणजे प्रत्येक अवलोकनक्रियेमध्ये मानवी मनाचा तर्कव्यापार न कळत चालू असतो. पदार्थापासून ज्या अवलोकन-संवेदना आपल्या मनावर उमटतात त्या एक प्रकारच्या खुणा असतात. त्यावरून त्याला दुसऱ्या इंद्रियांनी कोणत्या संवेदना अनुभवतां येतील हे समजते. आतां उघड उघड संवेदना या मानवी मनावर अवलंबून आहेत. मानवी मन नसेल तर संवेदना नाहीत व संवेदना नाहीत म्हणजे पदार्थ नाहीत. उदाहरणार्थ आंधळ्याला रंगाच्या संवेदना नाहीत. म्हणून त्याला डोळ्याने कोणत्याच गोष्टीचे आस्तित्व कळत नाही व त्या आंधळ्याला जर दुसरी स्पशेंद्रियांसारखी इंद्रिये नसली तर त्याला बाह्य वस्तूचे ज्ञान कांहीं होणार नाही, नव्हे बाह्य वस्तु ही कल्पनाच त्याला होणार नाही. त्याला भासणाऱ्या सर्व गोष्टी मानसिक आहेत असे त्याला वाटेल. यावरून संवेदना या एक प्रकारची भाषा आहे असे म्हणणे प्राप्त आहे. ज्याप्रमाणे भाषेतील शब्दाचे द्वारे शब्दापेक्षां अगदी भिन्न अशा वस्तूचे आपल्याला<noinclude>{{center|७३}}</noinclude>
17worwcyufnl5phrot1eb663lhkkqy8
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८०
104
110329
230260
229932
2026-05-21T12:18:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230260
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>ज्ञान होते, त्याप्रमाणे एका प्रकारच्या संवेदनांवरून भिन्न संवेदनांचे आपल्याला ज्ञान होते. हाच बार्क्लेच्या पहिल्या ग्रंथाचा मथितार्थ आहे.<br>{{gap}}या ग्रंथानंतर लवकरच प्रसिद्ध झालेला बार्क्लेचा दुसरा ग्रंथ म्हणजे 'मानवी ज्ञानावरील ग्रंथ' होय. या ग्रंथांत बार्क्लेने 'जड द्रव्य' 'बाह्य वस्तु' व 'अचेतन सृष्टि' या कल्पनांवरच घाला घातला आहे. ज्याला आपण बाह्य वस्तु म्हणतो, ज्या मानवी मनापासून अगदी भिन्न आहेत असे आपण समजतो त्या वस्तूचे ज्ञान आपल्याला इंद्रियांच्या संवेदनांनी होते. एखादें नारिंग आपण पाहतो, त्याच्या रंगाचे ज्ञान आपल्याला डोळ्याने होते, त्याच्या आकाराचे, त्याच्या मदुपणाचें ज्ञान स्पर्शाने होते, त्याचा सुवास नाकाने कळतो, त्याची रुचि जिभेने कळते. सारांश नारिंगाचे सर्व गुण आपल्याला निरनिराळ्या इंद्रियांनी कळतात. आतां आपली इंद्रिये आपल्या मनांत संवेदना उत्पन्न करतात, म्हणजे आपले बाह्य वस्तूचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे, ज्यांना आपण बाह्य वस्तूंचे गुण म्हणतो त्या सर्व संवेदनाच होत. तेव्हां आतां बाह्य वस्तूंचे बाह्यत्व व स्वतंत्र अस्तित्व कोठे राहिले? कारण समजा, आपण पहात असलेलें नारिंग गुप्तपणे नाहीसें झालें, पण जोपर्यंत आपल्या मनाला रंगाच्या, आकाराच्या, मृदुपणाच्या, सुवासाच्या, रुचीच्या व इतर गुणांच्या संवेदना भासत आहेत, तोपर्यंत ते नारिंग नाहीसे झाले आहे असे आपल्याला कळणारच नाही. अर्थात् पहिल्यापासूनच नारिंग नसले तरी त्याचीहि प्रतीतेि आपल्याला होणार नाही. जोपर्यंत आपल्याला संवेदना होत आहेत तोपर्यंत बाह्य वस्तु आहेच असें आपले मन आपल्याला सांगणार. तेव्हां बाह्य वस्तु म्हणजे संवेदनांचा समुदाय होय. वस्तूचे गुण म्हणजेही संवेदनाच होत. संवेदनाच्या किंवा गुणांच्या पाठीमागे असणारी निराळी आणखी बाह्य वस्तु नाही. तेव्हां बाह्य वस्तूची बार्क्लेच्या मताने खालील व्याख्या ठरते. नियमाने एकत्र राहणाऱ्या संवेदनांचा समुदाय म्हणजे बाह्य वस्तु होत. बाह्य वस्तूंना मानवी मनाव्यतिरिक्त निराळे अस्तित्व नाही. या दृष्टीने जगांत जड म्हणून पदार्थच नाही असे होते;<noinclude>{{center|७४}}</noinclude>
iyxkiz5impb74tn7acdw3hsn1siyi4j
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८१
104
110330
230261
229933
2026-05-21T12:22:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230261
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>सर्व कांहीं चिन्मय आहे, कारण जड वस्तु ही मानवी मनाच्या संवेदना होत.<br>{{gap}}पण या सिद्धांतावर एक जबरदस्त आक्षेप येतो तो हा की, बाह्य वस्तु व सृष्टि ही संवेदनांसारखी क्षणिक ठरते. संवेदना अनुभवण्यास मनुष्य नसला की जग नाही असे यावरून सिद्ध होते. आपण निजलों की जग नाहीसे झाले या दृष्टीने 'आप गई डुब गई दुनिया' ही म्हण खरी ठरते. व ज्या वेळी जगावर मानवी प्राणी नव्हते तेव्हां जग नव्हते, असेहि या दृष्टीने निष्पन्न होते. या आक्षेपाच्या निराकरणांत बार्क्ले, परमेश्वरविषयक तत्व पुढे येते. मनुष्य पहात नसला, मानवी मन विनाश पावले तरी बाह्य सृष्टि विनाश पावत नाही. कारण अविनाशी व शाश्वत असा परमेश्वर आहेच. तेव्हां मनुष्य जरी निजला असला तरी जग नाहीसे होत नाही. कारण परमेश्वर सदा पाहत आहे. कारण बाह्य वस्तु जर संवेदनासमुदाय होत तर कोणत्या तरी मनाच्या, परमेश्वरी किंवा मानवी, संवेदना सतत चालूच आहेत. तेव्हां बार्क्लेच्या मतें बाह्य सृष्टि म्हणून कांही एक स्वतंत्र तत्त्व नाही. ते सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून आहे. परमेश्वर शाश्वत व अविनाशी आहे म्हणून सृष्टि ही शाश्वत व अविनाशी आहे. कारण सृष्टि ही परमेश्वराची संवेदनाच आहे, तेव्हां जगात दोन चिन्मय तत्वे आहेत एक परमेश्वर किंवा परमात्मा व दुसरें मनुष्य किंवा जीवात्मे. मनुष्याचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे, या संवेदना अन्वर्थक किंवा सूचक आहेत. म्हणजे एका प्रकारच्या सवेदनांवरून दुसऱ्या प्रकारच्या संवेदनांचे अनुमान करता येते. ज्याप्रमाणे वस्तूच्या रंगाच्या आकृतीवरून वस्तूचे अंतर आपल्याला कळते, त्याचप्रमाणे एका प्रकारच्या संवेदनांवरून दुसऱ्या प्रकारच्या संवेदनांचा आपल्याला अंदाज करता येतो. सृष्ठीचे ज्ञान म्हणजे या संवेदनांच्या सूचकत्वाचे ज्ञान होय. हे ज्ञान मनुष्याला अनुभवाने व संवईने येते. अमक्या संवेदनांचा अमुकच अर्थ कां याला काहीएक कारण देतां येत नाही. तसा आपला अनुभव आहे इतकेच आपल्याला म्हणतां येते.{{nop}}<noinclude>{{center|७५}}</noinclude>
o1idxyd7rssqmiukb9qs27ot4k0kx3e
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८२
104
110331
230262
229934
2026-05-21T12:34:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230262
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>{{gap}}येथे बार्क्लेचे पूर्ववयांतील तत्वज्ञान संपले. या तत्वज्ञानाचा हेतु मागे सांगितल्याप्रमाणे आस्तिक्य व धर्मनिष्ठा उत्पन्न करण्याचा होता व बार्क्लेच्या मते तो त्याने बऱ्याच अंशाने साध्य करून घेतला. कारण त्याच्या मते धर्माचा अत्यंत मोठा शत्रु म्हणजे जडवाद होय. सर्व जग- मानवी मनसुद्धां- मूळ जड द्रव्यापासून झाले आहे असें आधिभौतिक शास्त्र म्हणतात. अर्थात् या जगाच्या उपपत्तीमध्ये परमेश्वराला जागाच राहत नाही. असे झाले म्हणजे धर्मनिष्ठा ही अजिबात नाहींशी होते. कारण धर्माचा मूळ आधार जो परमेश्वर तोच जडामध्ये विलीन होतो. बार्क्लेने आपल्या तत्वज्ञानविषयक विचारांनी या आधिभौतिक शास्त्रीय विचारसरणींतील मूळ काटा काढून टाकला. त्याचे म्हणणे असें, मनुष्याच्या अवलोकनशक्तीचे पृथक्करण केले किंवा त्याच्या ज्ञानाचे पृथक्करण केले तर असे दिसून येते की, ज्याला 'जड द्रव्य' 'जड आदि तत्व' म्हणतात ती कल्पना मुळांतच विसंगत आहे. सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे. त्या संवेदना चित्स्वरूप आहेत व त्यावरून परमात्मा व जीवात्मा अशी दोन तत्वे शाबीत होतात व जड तत्वाला वावच रहात नाही; नव्हे 'जड तत्व' ही कल्पना अज्ञानमूलक भासते. कारण तिच्या अस्तित्वाला कांहींच प्रमाण दाखवितां येत नाही, तेव्हां अशा अज्ञानमूलक पायावर उभारलेली जडवादाची व नास्तिक्य वादाची सर्व इमारत ढासळून पडते. व मग अर्थात् मनुष्य धर्मपरायण बनण्यास उशीर लागत नाही.<br>{{gap}}याप्रमाणे मानवी ज्ञानाच्या पृथक्करणाने जड तत्वाची कल्पना निराधार भासते; तर त्याच पृथक्करणाच्या योगे आपल्या आत्म्याची आपल्याला प्रचीति येते. जर सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे तर अर्थात् या संवेदना अनुभवणारा आत्मा अवश्यमेव असला पाहिजे असा आपत्याला प्रत्यय येतो. तसेंच संवेदना या शाश्वत आहेत, कायमच्या आहेत; त्याचप्रमाणे त्या एकमेकांच्या सूचक आहे; यावरून हे सर्व घडवून आणणारा परमात्मा याच्या अस्तित्वाबद्दल मनाची खातरी पटते.<noinclude>{{center|७६}}</noinclude>
t9kgn63q6fo1x9239vgvqtyshbamzvx
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८३
104
110332
230263
229935
2026-05-21T12:40:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230263
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>हेच बार्क्लेच्या पूर्ववयांतील तत्वज्ञानाचे सार आहे. यांत बार्क्लेचा भर ज्ञान संवेदनात्मक आहे, व जडवाद हा विसंगत व बुद्धीला अग्राह्य आहे असे सिद्ध करण्याकडे आहे.<br>{{gap}}हीच मते बार्क्लेने नंतरच्या आपल्या ग्रंथांत संभाषणरूपाने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढे बार्क्लेचे लक्ष अमेरिकेत विश्वविद्यालय स्थापण्याच्या योजनेकडे लागले व याच काळांत त्याच्या वाचनांत प्लेटोच्या ग्रंथाने प्रमुख स्थान पटकावले व प्लेटोच्या विचारांचा बार्क्लेवर पगडा बसला. याचा परिणाम असा झाला की, त्याच्या मध्यकालीन तात्त्विक विचारांत थोडासा फरक पडला. आतां बार्क्लेला ज्ञानाचे संवेदनात्मक पृथक्करण अपुरे भासू लागले. संवेदनाखेरीज ज्ञानाचे विचाररूपी एक अंग आहे असें बार्क्लेच्या ध्यानात येऊ लागले. तेव्हापासन जडवादा विरुद्ध प्रतिपादनावरील त्याच्या लेखांचा भर कमी झाला व या जगाच्या मूळाशी परमात्मा व त्याचे विचार आहेत अशा प्रकारचे विवेचन जास्त जोराने पुढे आले. तसेंच संवेदनाचे सूचकत्व अनुभवाने- संवईने कळतें असें पूर्वी बार्क्ले प्रतिपादन करीत असे त्याचेऐवजी सूचकत्व हे परमात्म्याच्या इच्छेचे व विचारशक्तीचें फळ आहे असे तो म्हणू लागला. सारांश, त्याच्या मध्यकालीन तत्त्वज्ञानमननांत परमात्म्याचे अस्तित्व व त्याचे स्वरूप व त्याच्या शक्ति या गोष्टींचा विचार त्याच्या मनापुढे प्रामख्याने येऊ लागला. व म्हणून या काळच्या ग्रंथांत परमात्म्याच्या अस्तित्वाची प्रमाणे बार्क्लेने जास्त जोराने पुढे मांडली. उदाहरणार्थ, या जगाच्या रचनेत किती चातुर्य व कुशलता भरली आहे. यावरून या जगाचा आदिकर्ता हा कसा सर्व शक्तिमान सर्वज्ञ आहे हे प्रमाण बार्क्लेने मोठ्या सुंदर रीतीने आपल्या ग्रंथांत ग्रंथित केले आहे.<br>{{gap}}त्याचे दुसरें प्रमाण अशा तऱ्हेचे आहे, मनुष्याला स्वतःचा आत्मा इंद्रियांनी दिसत नाही तर त्याची प्रतीती स्वयंस्फूर्तीने होते, परंत मनुष्याला दुसऱ्या आत्म्याचे ज्ञान फक्त अनुमानाने होते. कारण आत्मा ही प्रत्यक्ष दृश्य वस्तु नाही. आता आपण आपल्या व्यतिरिक्त आत्म्याच्या<noinclude>{{center|७७}}</noinclude>
0eb9aqg6llw82dne0x0w47ii4kto6b7
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८४
104
110333
230264
229936
2026-05-21T12:45:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230264
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्त्वज्ञानी.'''</u></noinclude>अस्तित्वाचे अनुमान कोणत्या खुणांवरून करतो? आपल्याला इच्छाशक्ति आहे, आपण काही गोष्टी स्वतः होऊन करूं शकतों; आपली कृत्ये सहेतुक केलेली असतात. अशाच तऱ्हेचे वर्तन दुसरे लोक करतांना आपण पाहतो. यावरून ते ज्ञानी व शक्तिमान आत्मे आहेत असें आपण अनुमान करतो. ते दुसरे आत्मे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत, पण त्या आत्म्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला ओळखतां येतात. आतां याच तऱ्हेनें सृष्टीच्या मूळाशी असलेल्या परमात्म्याच्या अस्तित्त्वाचे आपल्याला अनुमान करतां येते. सृष्टीचा क्रमही इतर बुद्धिमान मनुष्याच्या वर्तनक्रमाप्रमाणे सहेतुक, बुद्धिपुरस्सर व युक्तीने व नियमितपणे चाललेला दिसतो. या खुणांवरून आपल्याला सृष्टीकर्त्याच्या कर्तृत्वाबद्दल अनुमान करता येते. सारांश जितक्या खातरीपूर्वक व ज्या अर्थाने आपल्याला दुसऱ्यांच्या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल ज्ञान होते तितक्याच खातरीपूर्वक व त्याच अर्थाने आपल्याला परमात्म्याच्या अस्तित्वाचे ज्ञान होते व जर आपण दुसरे आत्मे प्रत्यक्ष पाहतों असें म्हटले तर आपण परमेश्वर पाहतो असें म्हणण्यास हरकत नाही, कारण दुसरे आत्मे व परमेश्वर हे दोन्ही अमूर्त आहेत व त्या दोघांचे ज्ञान आपल्याला सारख्या तऱ्हेने होते. असो.<br>{{gap}}सारांश, बार्क्लेच्या या मध्यकालीन तत्वज्ञानांत त्याचा भर जड सृष्टीचा अभाव दाखविण्यावर नव्हता. तर त्या तत्वज्ञानाची भर परमेश्वराचे स्वरूप व त्याचे अस्तित्व हे शाबीत करण्याचा होता व तो बार्क्लेनें चांगल्या रीतीने पार पाडला.<br>{{gap}}पुढे दहा वर्षे बार्क्लेने तत्वज्ञानविषयक ग्रंथ लिहिला नाही. त्याचा शेवटला तत्वज्ञानविषयक ग्रंथ 'सांखळी' हा होय. हा बार्क्लेने आपल्या साठाव्या वर्षी लिहिला. मागे सांगितल्याप्रमाणे या ग्रंथांत वैद्यकविषयक व तत्वज्ञानविषयक विचारांचे विलक्षण मिश्रण झाले आहे. त्यांत डामराच्या सर्वरोगशमनक्षमत्वापासून प्रारंभ करून या विशेषाचे कारण शोधतां शोधतां बार्क्ले सृष्टीच्या मूळाकडे गेला आहे व हे मूळ म्हणजेच सर्वशक्तिमान,<noinclude>{{center|७८}}</noinclude>
hhrm9br94z8ees0o2ksp0f8usgduic5
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८५
104
110334
230265
229937
2026-05-21T12:49:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230265
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''जॉर्ज बार्क्ले.'''</u>}}</noinclude>सर्वज्ञ, सर्वगुणवान असा परमेश्वर आहे असे त्याने प्रतिपादन केले आहे.सर्व सृष्टि या परमेश्वराच्या इच्छा व बुद्धि यांचा विकास होय. सृष्टीचे इंद्रियांना गोचर होणारे स्वरूप हे खरे स्वरूप नव्हे, तर इंद्रियांनी दिलेल्या संवेदनांच्या आंत मानवी बुद्धीला पटणारे असें बौद्धिक स्वरूप आहे व हे स्वरूपच खरें होय व हे स्वरूप म्हणजे परमेश्वराचे शाश्वत विचार होत. या ग्रंथांत बार्क्लेच्या मनावर प्लेटो या तत्ववेत्त्याच्या विचारांचा फार परिणाम झालेला आहे असे पदोपदी दृष्टोत्पत्तीस येते. सारांश बार्क्लेला आता जगाकडे दोन दृष्टीने पहावेसे वाटे, एक इंद्रियहष्टि व दुसरी बौद्धिक दृष्टि. व जगाला दोन स्वरूपे आहेत, असें तो आतां प्रतिपादन करूं लागला.<br>{{gap}}बार्क्लेच्या तत्वज्ञानाचे इतके विवेचन पुरे आहे. यापेक्षा जास्त खोल पाण्यांत शिरण्यांत अर्थ नाही. बार्क्लेच्या तत्वविचारांत एकसारखा बदल होत गेलेला आहे असें वरील विवेचनावरून दिसून येईल. पूर्ववयांत व उमेदीत बार्क्ले हा ज्ञानाच्या स्वरूपासंबंधाने संवेदनावादी (sensationalist) होता व यामुळे तो इंग्रज तत्वज्ञानी लॉक याच्या मताचा अनुवादक होता असे म्हटले तरी चालेल. या बार्क्लेच्या पूर्ववयांतील तात्विक विचारांच्या पुढची पायरी ह्यूम या तत्वज्ञान्याने स्वीकारून लॉक व बार्क्ले यांच्या तात्विक विचारांवरून संशयवाद असा निष्पन्न होतो हे दाखविलें म्हणून तत्वज्ञानाचे इतिहासकार लॉक, बार्क्ले व ह्यूम अशी तत्वज्ञान्यांची परंपरा लावतात. बार्क्लेच्या मध्ययुगीन तात्विक विचारांचे साम्य रीड या स्कॉटिश तत्वज्ञान्याच्या विचारांशी आहे असे दिसते व त्याच्या उत्तर वयांत तो प्लेटो या तत्वज्ञान्याच्या विचारांच्या नजीक येत चालला होता असे दिसते. सारांश, बार्क्ले हा आमरणांत तत्वज्ञानाचा विद्यार्थी होता व त्याच्या विचारांची सारखी परिणति होत होती व म्हणून बार्क्लेचे तत्वज्ञान म्हणजे युरोपच्या अर्वाचीन तत्वज्ञानाची लहान आवृत्तिच होय असे म्हटलेले आहे व त्यांत बराच तथ्यांश आहे असे वरील विवेचनावरून वाचकांच्या ध्यानात येईल.{{nop}}<noinclude>{{center|७९}}</noinclude>
ngpa28swwobhgwhepf17jjhhu4o8ak8
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८६
104
110337
230274
229997
2026-05-22T06:51:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230274
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''कँट.'''}}}}
{{rule|5em}}
{{center|(१)}}<br>
{{center|{{x-larger|जीवन-वृत्तांत.}}}}
{{rule|7em}}
{{gap}}मथळ्यांतील नांव वाचतांच माझे वाचक म्हणतील "हे लेखक लागले आपल्या आवडत्या तत्वज्ञान्याच्या गोष्टी बोलायला! कँट मोठा तत्त्वज्ञानी असेल, पण त्याचे काय आम्हांला! मराठीतील आध्यात्मिक वाङ्मयाला कंटाळून तर आम्ही अर्वाचीन ललितवाङ्मय करमणुकीकरितां व विश्रांतीकरितां वाचायला घेतो. तो येथेहे आमच्या पाठीस अध्यात्मविद्या आहेच! त्यांतल्या त्यांत आम्ही असेंहि ऐकिले आहे की, कँटचे तत्त्वज्ञान तर फार खोल, फार गूढ आणि अत्यंत दुर्बोध आहे. ज्यांची जन्मभाषा जर्मन, अशा लोकांना सुद्धा कँटचे ग्रंथ समजत नाहीत, ते समजण्यास त्यांना इंग्रजी व फ्रेंच भाषेतील भाषांतरांची मदत घ्यावी लागते. तेव्हां असले गूढ, दुर्बोध व कठीण तत्वज्ञान आम्हाला कशाला?"<br>{{gap}}यावर माझे असे म्हणणे आहे की, कँट हे नांव ऐकल्याबरोबर माझ्या प्रिय वाचकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गुलाब म्हटल्याबरोबर गुलाबाच्या झाडाच्या कांट्यांचीच अठवण कां करावी? गुलाबाच्या फुलाची आठवण केल्यास व त्या गुलाबाचा सुवास, त्याच्या पानांची सुकुमारता, त्याचा मोहक रंग, यांचा विचार मनांत आणल्यास मनाला आल्हादच होईल. तसेच या विषयासंबंधीहि होईल अशी मी वाचकांची खातरजमा करतो. कारण, मी या लेखांत कँटच्या तत्त्वज्ञानाचे फारस विवेचन करणार नाही; केले तरी कँटच्या तत्वज्ञानरूपी डोहांत मी वाच-<noinclude>{{center|८०}}</noinclude>
1j6wu918v7lfhdn3xisvy9xwee91kxs
230275
230274
2026-05-22T06:52:19Z
कल्पनाशक्ती
3813
230275
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''कँट.'''}}}}
{{rule|5em}}
{{center|{{x-larger|(१)<br>जीवन-वृत्तांत.}}}}
{{rule|7em}}
{{gap}}मथळ्यांतील नांव वाचतांच माझे वाचक म्हणतील "हे लेखक लागले आपल्या आवडत्या तत्वज्ञान्याच्या गोष्टी बोलायला! कँट मोठा तत्त्वज्ञानी असेल, पण त्याचे काय आम्हांला! मराठीतील आध्यात्मिक वाङ्मयाला कंटाळून तर आम्ही अर्वाचीन ललितवाङ्मय करमणुकीकरितां व विश्रांतीकरितां वाचायला घेतो. तो येथेहे आमच्या पाठीस अध्यात्मविद्या आहेच! त्यांतल्या त्यांत आम्ही असेंहि ऐकिले आहे की, कँटचे तत्त्वज्ञान तर फार खोल, फार गूढ आणि अत्यंत दुर्बोध आहे. ज्यांची जन्मभाषा जर्मन, अशा लोकांना सुद्धा कँटचे ग्रंथ समजत नाहीत, ते समजण्यास त्यांना इंग्रजी व फ्रेंच भाषेतील भाषांतरांची मदत घ्यावी लागते. तेव्हां असले गूढ, दुर्बोध व कठीण तत्वज्ञान आम्हाला कशाला?"<br>{{gap}}यावर माझे असे म्हणणे आहे की, कँट हे नांव ऐकल्याबरोबर माझ्या प्रिय वाचकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. गुलाब म्हटल्याबरोबर गुलाबाच्या झाडाच्या कांट्यांचीच अठवण कां करावी? गुलाबाच्या फुलाची आठवण केल्यास व त्या गुलाबाचा सुवास, त्याच्या पानांची सुकुमारता, त्याचा मोहक रंग, यांचा विचार मनांत आणल्यास मनाला आल्हादच होईल. तसेच या विषयासंबंधीहि होईल अशी मी वाचकांची खातरजमा करतो. कारण, मी या लेखांत कँटच्या तत्त्वज्ञानाचे फारस विवेचन करणार नाही; केले तरी कँटच्या तत्वज्ञानरूपी डोहांत मी वाच-<noinclude>{{center|८०}}</noinclude>
68wzelt68900h6j8rloj1dnhwo626in
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८७
104
110338
230276
229998
2026-05-22T07:04:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230276
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>कांना बुडवू इच्छित नाही. फार तर पाऊलभर पाण्यांत वाचकांना नेऊन तेथून मी त्यांना कोरडया जागेवर आणून सोडीन. या लेखात मला कँटचे मुख्यतः चरित्र सांगावयाचे आहे. आणि जितके कँटचे तत्वज्ञान नीरस, गूढ व दुर्बोध आहे, तितकेच त्याचे चरित्र सरस, साधे व सुगम आहे, असे आपल्यास आढळून आल्याखेरीज रहाणार नाहीं.<br>{{gap}}ज्याप्रमाणे अथेन्सचे नांव काढल्या बरोबर सॉक्रटिसाची आठवण होते. कारण अथेन्स व सॉक्रटिस यांमध्ये एक प्रकारची व्याप्ति आहे- सॉक्रेटिसाचे सर्व आयुष्य या एका शहरांतच गेले, त्याचप्रमाणे कँट व कानिग्सबर्ज यांचीहि व्याप्ति आहे. मात्र अथेन्स शहर हे सॉक्रेटिसाच्या आधींपासून जगद्विख्यात शहर होते. परंतु कानिग्सबर्जची तशी स्थिति नव्हती. कँटच्या पूर्वी हे जर्मनींतील विद्यापीठ अगदी अज्ञात, मागसलेले आणि एका कोनाकोपऱ्यांतले होते; परंतु कँटच्यामुळे त्याला सरस्वती मंदिराची पदवी आली व ज्याप्रमाणे एखाद्या पुण्यक्षेत्री भाविकांची यात्रा भरावी, त्याप्रमाणे कँट या तत्ववेत्त्याला पाहण्याकरतां युरोपांतील हजारों विद्याभक्त आणि विद्याभाविक लोक त्या ठिकाणी येऊ लागले.<br>{{gap}}कानिग्सबर्ज या गांवीं कँटचा जन्म १७२४ च्या एप्रिल महिन्यांत झाला. कँटच्या बापाचा कातड्याच्या वाद्या करण्याचा धंदा होता. त्याची घरची स्थिति फार गरीबीची होती, तरी पण तो मोठा बाणेदार मनुष्य होता. व त्याला आपल्या मतांचा मोठा अभिमान असे. क्रिश्चन धर्मातील एक पोटभेद भक्तिपथ म्हणून निघाला होता, त्याचा तो अनुयायी होता व या आपल्या मताकरतां तो लोकच्छल सोसण्यासही तयार असे. कँटची आईहि फारच भाविक असे व कँटच्या मनावर तिच्या भक्तिपंथी शिक्षणाचा फार ठसा उमटला होता. कँट आपल्या उतारवयांत सुद्धां आपल्या आईबद्दल मोठया प्रेमाने आणि आदराने बोलत असे. कँटचे सर्व शिक्षण या गांवांतच झाले. कँटच्या तेराव्याच वर्षी त्याची आई आपल्या एका मैत्रिणीची शुश्रूषा करीत असतांना ताप येऊन वारली. कँट आपल्या सोळाव्या वर्षी मॅट्रिक्युलेशन पास होऊन कॉलेजांत गेला.<noinclude>{{center|८१}}</noinclude>
tovkv5bmos8pwk1b4wf2fobaetgyvlt
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८९
104
110339
230278
229999
2026-05-22T07:16:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230278
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>शिक्षकांचे वेतन मुळी त्यांच्या व्याख्यानांच्या चांगुलपणावर अवलंबून असे. त्यांची व्याख्याने जर चांगली नसतील तर त्यांच्याकडे विद्यार्थी जाणार नाहीत, व त्यांचे वेतन तर मुलांच्या फीवर अवलंबून; तेव्हां त्यांना आपले बुद्धिसर्वस्व आपल्या विषयावर खर्च करावे लागे. पगारी प्रोफेसरांना मुलांच्या फीवर विसंबावे लागत नसे. परंतु त्यांचा दर्जा व मान मोठा असल्यामुळे तो राखण्याकरिता त्यांनाहि फार मेहनत करावी लागे. कारण जर त्याची व्याख्याने चांगली नसली व बिनपगारी शिक्षकांची चांगली असली तर मुले बिनपगारी शिक्षकांकडे जातील व असे झाले म्हणजे ती प्रोफेसराला कमीपणाची गोष्ट वाटे. या पद्धतीमुळे बिनपगारी शिक्षक व पगारी प्रोफेसर या दोघांनाहि आपापल्या विषयांत फारच पारंगतता मिळवावी लागते. असो.<br>{{gap}}बिनपगारी शिक्षक या नात्याने कँटने सुमारे पंधरा वर्षे काढल्यानंतर १७७० साली त्याची महत्त्वाकांक्षा पुरी झाली. त्याला तत्त्वज्ञानाच्या प्रोफेसराची फार मोठ्या मानाची जागा मिळाली, व त्या जागेवर तो मरेपर्यंत होता. दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याला प्रोफेसरांच्या जागा देऊ केल्या होत्या, परंतु त्याने आपली युनिव्हर्सिटी सोडली नाही, व तेथली जागा कमी पगाराची असतांना तेथेच राहणे त्याला बरे वाटले.<br>{{gap}}कँटचे सर्व आयुष्य अध्ययन, अध्यापन आणि लेखन यांमध्येच गेले. यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये किंवा चरित्रामध्ये वैचित्र्य किंवा निरनिराळे प्रसंग नाहीत, हे खरे आहे. त्याचा आयुष्यक्रम अगदी आपल्या इकडल्या ऋषीसारखा होता. कारण, कँट संसारपाशांत पडला नाही. प्रथमतः त्याची फार गरिबी होती, व कुटुंबपोषण करण्यासारखी पैशाची स्थिति नव्हती. यामुळे त्याने लग्न केले नाही. पुढे चांगली स्थिति आल्यावर त्याला लग्न करता आले असते, व एका बाईवर कँटचे मनहि गेले होते; परंतु त्या बाईने दुसऱ्या एका गृहस्थाशी लग्न केल्यामुळे कँटचा बेत तसाच राहिला. पुढे आपले लग्नाचे दिवस निघून गेले, असें समजून कँट ब्रह्मचारीच राहिला. कँटच्या या एकलकोंड्या आयुष्याबद्दल<noinclude>{{center|८३}}</noinclude>
f0f5kxz7vk4bswyqjvq68zmyr898zkg
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८८
104
110340
230277
230000
2026-05-22T07:13:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230277
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>युनिव्हर्सिटीत त्याने एकंदर सात वर्षे अभ्यास केला. त्याच्या घरची गरीबी असल्यामुळे त्याचे मित्र त्याला थोडी फार पैशाची व इतर आवश्यक गोष्टीची मदत करीत असत आणि त्याच्या मोबदला कँट हा त्यांना शिकवीत असे. परंतु हे सर्व दिवस त्याला मोठ्या कष्टानेच काढावे लागले.<br>{{gap}}१७४६ साली, म्हणजे कँटच्या २२ व्या वर्षी त्याचा बाप वारला, आणि त्यामुळे कँटला आपले शिक्षण सोडून पोटापाण्याच्या उद्योगाला लागावे लागले. कँटची मोठी महत्त्वाकांक्षा म्हणजे कॉनिग्सबर्ज विश्वविद्यालयांतील प्रोफेसरची जागा मिळविण्याची होती. परंतु आतां त्याला आपले शिक्षण अर्धवट टाकून, एका सुखवस्तु कुटुंबांतील खासगी शिक्षकाचा धंदा पत्करावा लागला. या रीतीने त्याने नऊ वर्षे काढली, व त्याच्या आयुष्यांतील हा कालच फक्त त्याने कॉनिग्सबर्जच्या बाहेर घालविला. या काळांत तो तीनचार कुटुंबांत राहिला. १७५५ मध्ये त्याने एक तात्त्विक विषयावर स्वतंत्र ग्रंथ लिहून डॉक्टरची पदवी मिळविली, व नंतर त्याला कॉनिग्सबर्ग विश्वविद्यालयांत बिनपगारी शिक्षकाची जागा मिळाली. तेव्हांपासून मरेपर्यंत म्हणजे सुमारे सतत पन्नास वर्षे, कँटने प्रोफेसराचे काम केले. जर्मन विश्वविद्यालयामध्ये पगारी प्रोफेसराचा दर्जा, पदवी व योग्यता मोठी असे, आपापल्या विषयांत पारंगत अशा लोकांना या जागा मिळत. दुसरा वर्ग बिनपगारी शिक्षकांचा असे. यांना विश्वविद्यालयांतून फक्त शिकविण्याची परवानगी मिळे, परंतु पगार मिळत नसे. विद्यार्थ्यांकडून जी काय फी मिळेल, त्यावरच यांना रहावें लागे. बिनपगारी शिक्षक व प्रोफेसर या दोघांची एकाच विषयावर व्याख्याने होत, व विद्यार्थ्यांना पाहिजे त्या व्याख्यानाना जाण्याची मोकळीक असे, जर्मनीतील एकंदर शिक्षण उच्च दर्जाचे राहण्यास या पद्धतीचा फार उपयोग झालेला आहे. जर्मनीतील विश्वविद्यालयाची युरोपांतील इतर विश्वविद्यालयांच्या वर कमान असण्याचे मुख्य कारण ही पद्धति होय, यांत शंका नाही. कारण, या पद्धतीमुळे शिक्षकांच्या दोन्ही वर्गांना आपापल्या विषयाची उत्तम तयारी करावी लागे. बिनपगारी<noinclude>{{center|८२}}</noinclude>
7i8htxwc3gucsp96ls6bx7wsv4kbw5p
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९०
104
110341
230279
230001
2026-05-22T07:20:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230279
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>गांवांतील लोकांना त्याची कीव येत असे, व त्या शहरांतील एका साध्या भोळ्या उपाध्यायाला त्याची कीव येऊन त्याने एक संभाषणात्मक लेख छापला व त्यांत गृहस्थाश्रम स्वीकारणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे, व गृहस्थाश्रम हा फार सुखदायी आश्रम आहे असेंहि प्रतिपादन करून कँटला लग्न करण्याचा आग्रह केला होता. हा लेख वाचून वृद्ध कँटला उपाध्यायाच्या आग्रहाचे हंसू आले. कँटने छापण्याचा खर्च त्या उपाध्यायाला दिला व विनोदाची गोष्ट म्हणून तो ही हकीकत आपल्या स्नेही मंडळीला सांगत असे.<br>{{gap}}परंतु आपल्या ब्रह्मचर्याबद्दल स्तोम माजविलेलें त्याला आवडत नसे. त्याचा बहुतेक वेळ शिकणे, शिकविणे व लिहिणे यांत जात असे. यामुळे त्याला पुढे लग्नाची आवश्यकता भासली नाही. शिवाय, कँटसारख्या विद्वान् व बहुश्रुत तत्वज्ञान्याला योग्य अशी स्त्री मिळणेहि कठिणच होते. परंतु यावरून कँट हा एकलकोंडा होता, किंवा त्याला एकलकोंडा आयुष्यक्रम आवडत असे अशांतला प्रकार नाही. त्याला स्नेहा-सोबत्यांची फार हौस असे, व त्याला सुस्थिति आल्यावर व त्याने बिऱ्हाड केल्यावर तो रोज आपल्या पंक्तीला आपल्या मित्रमंडळीतील शेलक्या लोकांना जेवावयास बोलवीत असे. केव्हांकेव्हां वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांनाहि तो जेवावयास बोलवीत असे. कँटला संभाषणाची कला फार चांगली आवगत असे, व त्याला संभाषणाची कलाहि फार उत्तम साधलेली असे. शिवाय त्याचे संभाषण मनोवेधक असून त्यांत विषयवैचित्र्यहि फार असे. पुष्कळ लोकांच्या संभाषणांत त्यांच्या नेहमीच्या व्यवसायाचे घोडें सारखं पुढे यावयाचे. हा दोष कँटच्या संभाषणांत केव्हांहि नसे. तो तत्वज्ञानासंबंधी केव्हाही संभाषण करीत नसे; कारण, तो म्हणे, संभाषणाचा तो विषय नव्हे. कँट फारच बहुश्रुत होता; तो प्रत्येक माणसाजवळ त्याच्या आवडत्या विषयावर बोले; व त्याच्याकडून माहिती काढून घेई; आणि आपल्याला असलेली माहिती सहजगत्या<noinclude>{{center|८४}}</noinclude>
1psvjg2es9dolia3hu9snbxv3uczdpa
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९१
104
110342
230280
230002
2026-05-22T07:25:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230280
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>दुसऱ्याला करून देई. यामुळे कँटच्या घरी जेवावयास जाणे म्हणजे भाग्याचे आहे असे सर्वांना वाटे.<br>{{gap}}कँट हा फार नियमितपणे चालणारा मनुष्य असल्यामुळे व त्याचा व्यवसायहि वैचित्र्यविहीन असल्यामुळे कँटच्या आयुष्याचे चित्र रेखाटणे सोपे आहे. कारण, एक दिवसाचा क्रम तोच आठवड्याचा, तोच महिन्याचा व तोच वर्षांचा. हा त्याचा नियमितपणा आश्चर्य करण्यासारखा होता. त्याची सर्व कामें घड्याळाप्रमाणे चालत असत. त्याच्या दिनचर्येचें खालील वर्णन त्याच्या चरित्रकारांनी दिलेले आहे.<br>{{gap}}पहाटेला पांच वाजायला पांच मिनिटें कमी असतांना कँटचा नोकर लँपी हा कँटच्या खोलीत शिरावयाचा व "प्रोफेसरसाहेब. वेळ झाली" असे म्हणावयाचा. या हाकेला कँट कधीहि न चुकतां ओ द्यावयाचा. व पांच मिनिटांत तो आपल्या बसावयाच्या खोलीत यावयाचाच. न्याहारीला तो चहाचा एक पेला- कधी कधी नकळत दोन तीन पेलेहि घेत असे- व तंबाकूची एक विडी घेई. ५ पासून ७ वाजेपर्यंत तो व्याख्यानाची तयारी करी. ७ वाजतां तो आपल्या शिकवावयाच्या वर्गात जाई व तेथून ९ वाजतां परत येई. तेव्हांपासून पाऊण वाजेपर्यंत तो आपल्या लेखनव्यवसायांत गुंतलेला असे. पाऊण वाजतां 'पाऊण झाला' असें म्हणून आपल्या स्वयंपाकिणीला हांक मारी, व त्याबरोबर स्वयंपाकीण दारूचा पेला घेऊन येई. जेवणाचे पहिले वाढप झाल्यावर कँट हा पेला पीत असे. त्याच्या आयुष्याच्या शेवटची पंचवीस वर्षे- (जेव्हां त्याचें स्वतंत्र घर असे) त्याच्याबरोबर नेहमी पाहुणे जेवावयास असत. पाहुणे दोहोंपेक्षा कमी नसत व पांचापेक्षा जास्त नसत. या पाहुण्यांना जेवणाच्या दिवशींच्या सकाळी बोलावणे पाठविले जात असे. एकदम बोलावणे करून ठेवणे त्याला आवडत नसे, किंवा आधीपासून केलेलेंहि आवडत नसे; परंतु कँट आपल्या पाहुण्यांपासून एका गोष्टीची अपेक्षा करी. व ती म्हणजे नियमितपणा ही होय! सर्व पाहुणे जमले, म्हणजे लँपी जेवणाच्या तयारीची वर्दी देई. हवेबद्दल बोलत बोलत सर्व मंडळी<noinclude>{{center|८५}}</noinclude>
qzcihax9r3xt7i1p5q350tcac7t0yg2
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९२
104
110343
230281
230004
2026-05-22T07:31:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230281
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>जेवणाच्या जागीं जमे. कँट आपला रुमाल बाहेर काढून सर्वांना सुरुवात करण्यास सांगे, व आपणहि जेवावयास सुरुवात करी. जेवण बहुधा तीन वाढी असे, व तें सुमारे तीन व केव्हां केव्हां चार तासहि चाले. जेवणाच्या वेळीं पुष्कळ वेळां राजकीय विषयांवर संभाषण होई. कँट हा वर्तमानपत्रांचा मोठा भोक्ता होता, व वर्तमानपत्रे आणणाऱ्या पोस्टाकडे मोठ्या आस्थेनें त्याचे डोळे लागलेले असत.त्या वेळीं युरोपांत फ्रान्स-मधल्या राज्यक्रांतीची खळबळ चालू असे, व त्याच्या आधी अमेरिकेतील स्वतंत्रतेकरितां युद्ध झाले, त्याची खळबळ चालू असे. कँटचा ओढा नेहमी स्वातंत्र्याकडे व प्रजापक्षाकडे असे, जेव्हां फ्रान्समध्ये प्रजा-सत्ताक राज्य स्थापन झाल्याची बातमी त्यानें ऐकली, तेव्हां तो म्हणाला, "आज माझ्या डोळ्यांचें पारणे फिटले! आतां मी सुखानें मरेन!"<br>{{gap}}जेवण आटोपल्यावर म्हणजे ४ वाजल्यानंतर कँट फिरावयास निघे. पहिल्यांदा तो इतर लोकांबरोबर फिरावयास जाई, पण पुढे पुढे तो एकटा फिरावयास जात असे. कारण नाकांतून श्वासोच्छ्वास केल्यानें रोगजंतु पोटांत जाणार नाहीत, असे त्याला वाटे. व म्हणून तो फिरतांना व बोलतांना तोंड मिटून चालत असे. त्याचा दुसरा एक नियम असे, तो हा कीं, केव्हांही अंगाला घाम येतां कामा नये. कँट हा नाजूक प्रकृतीचा होता; धट्टाकट्टाही नव्हता, किंवा तो नेहमीं आजारी असे, असेही नाहीं. तरी पण खाण्यापिण्यासंबंधी व वागण्यासंबंधी बाताबेतानें राहून तो इतकी वर्षे जगला. रपेट करून आल्यावर बारीकसारीक कामे करावयाची, नवीन पुस्तकें चाळावयाचीं व वर्तमानपत्रे पहावयाची, काळोख पडल्यावर तो आपल्या आवडत्या विषयावरील प्रश्नासंबंधी विचार करीत बसे, रात्री दहांच्या सुमाराला तो निजावयास जाई. ही त्याची दिनचर्या दिवसानुदिवस, मासानुमास व वर्षानुवर्ष चाले.<br>{{gap}}त्याच्या या व्यवसायासंबंधी एक मजेदार गोष्ट सांगतात. कँट हा आपल्या अभ्यासाच्या खोलीत बसून विचार करी व मनाची एकाग्रता होण्याकरतां आपल्या खिडकींतून दिसणाऱ्या एका देवळाच्या मनोऱ्या-<noinclude>{{center|८६}}</noinclude>
drhkdfqho9xmd9ogn9aoqyhqd4s4cfj
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९३
104
110344
230282
230005
2026-05-22T07:40:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230282
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>कडे पहात असे. त्या मनोऱ्याच्या टोकाकडे दृष्टि दिली, म्हणजे त्याचे चित्त एकाग्र होऊन त्याची विचारशक्ति चांगली चाले. परंतु कँटच्या शेजाऱ्याच्या बागेत पॉपलर नांवाचे वृक्ष होते, ते वाढत वाढत जाऊन एके दिवशी तो मनोरा कँटच्या दृष्टिआड झाला. या आडकाठीने कँटच्या चित्ताची एकाग्रता न साधून त्याच्या विचाराच्या व्यवसायांत व्यत्यय येऊ लागला. आपल्याला यामुळे काही सुचत नाही असे कँट आपल्या मित्राजवळ बोलला. त्या मित्राने ही अडचण त्या शेजाऱ्याला सांगितली. शेजारी चांगला भला मनुष्य होता व त्याला कँटबद्दल आदरहि होता. तेव्हां त्याने आपली पॉपलर झाडे छाटून टाकली व कँटला तो मनोरा पुनरपि दिसू लागला, आणि तेव्हापासून त्याच्या विचारांचे काम पुनः निर्वेधपणे चालू झालें!<br>{{gap}}त्याच्या असल्याच संवयीची आणखीहि एक गोष्ट सांगतात. कँट वर्गात व्याख्यान देतांना बहुधा एका विवक्षित मुलाकडे पहात असे व विशेषतः त्याच्या एका बटणाकडे पहात राही; परंतु एके दिवशी त्या मुलाच्या कोटाचे बटन पडून गेले व त्या दिवशी कँटच्या व्याख्यानाचा अगदी घोटाळा झाला. त्याला नेहमी प्रमाणे बोलतां येईना व क्रमवार विचार सुचेनात!<br>{{gap}}कँटचे मुख्य व्यवसाय दोन, हे वर सांगितलेच आहे. एक लेखन व दुसरा अध्ययन. कँट हा फार मोठा तत्त्वज्ञानी होऊन गेला, अशी जरी त्याची कीर्ति आहे तरी तो मारूनमुटकून तत्वज्ञानी झाला, असें म्हणण्यास हरकत नाही. कारण लहानपणापासून त्याचे आवडते विषय म्हणजे गणित व आधिभौतिक शास्त्रे हे होते. अगदी लहानपणापासून त्याला न्यूटनच्या ग्रंथांचा फार नाद लागलेला होता. तत्वज्ञानाकडे त्याचे लक्ष्य मागाहून गेले व हाच विषय शेवटी त्याचा मुख्य विषय बनला. पण कँट हा केव्हांहि घटपटाची खटपट करणारा तत्वज्ञानी बनला नाही. त्याच्या अंगी बहुश्रुतपणा व विषयवैचित्र्याची अभिरुचि शेवटपर्यंत कायम राहिली. त्याचे ग्रंथ व लेख निरनिराळ्या विषयांवर आहेत. तो मासिक पुस्तकांत<noinclude>{{center|८७}}</noinclude>
22ti3so2aadwc0avmcq1wnv0orqgo88
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९४
104
110345
230283
230006
2026-05-22T07:45:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230283
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>प्रचलित विषयांवर लेख लिहीत असे. त्याच्या लेखांची भाषा दुर्बोध नसे. त्याचे काही काही लेख तर फारच मनोरंजक व विनोदाने भरलेले आहेत.<br>{{gap}}जरी कँटचे तत्वज्ञानविषयक ग्रंथ फार दुर्बोध असले तरी तो शिक्षक या नात्याने फार चांगला वक्ता असे. नवीन मुलांच्या मनांत विषय भरवून देण्याचे कसब त्याला चांगले साधलेले होते. तो वर्गात जणूं काय एखाद्या तत्वज्ञानविषयक विचारसरणीचा प्रयोग करून दाखवी. प्रत्यक्ष माहिती सांगण्यापेक्षां विद्यार्थ्यांना तो विचार करण्यास शिकवी, असे म्हणणे जास्त बरोबर होईल. तसेंच विषयाचे विवेचन करतांना तो दाखले, उदाहरणे, गोष्टी इत्यादि सांगे. यामुळे त्याचे व्याख्यान फार मनोरंजक होई. मागे सांगितलेच आहे की, तो निरनिराळ्या विषयांवर व्याख्यानमाला चालू करीत असे. काही विषयांवरील त्याची व्याख्याने फारच लोकप्रिय असत. भूगोलविषयक पदार्थविज्ञानशास्त्र हा विषय त्याचा हातखंडा असे व गांवांतील प्रौढ गृहस्थ, सैन्यांतील अधिकारी, व्यापारी वगैरे लोक सुद्धा कँटची ही व्याख्याने ऐकावयास येत असत. तसंच पदार्थविज्ञानशास्त्र, किंवा ज्याला अर्वाचीन काळी समाजशास्त्र म्हणतात, त्याविषयावरील कँटची व्याख्यानमालाही फार लोकप्रिय असे. कारण तो प्रत्येक विषयाची संपूर्ण माहिती मिळवून तिचे आपल्या मनाशी तादात्म्य करून घेई. यामुळे त्याचे ज्ञान अगदी सत्यमय असे, व म्हणून त्याचा ठसा दुसऱ्याच्या मनावर तो बरोबर वठवून देई.<br>{{gap}}इ. स. १७५५ मध्ये लिसबन शहरी फार मोठा धरणीकंप झाला. त्याबरोबर या विलक्षण सृष्टिचमत्काराची माहिती देण्याकरतां कँटने एक उत्तम लेख 'धरणीकंप' या विषयावर लिहिला व त्यांत या संबंधाची उपलब्ध माहिती व या चमत्काराची उपपत्ति यांचे सुरस विवरण केले. १७६० च्या सुमारास स्वीडनबार्ज नांवाचा मनुष्य प्रसिद्धीस आला. आपल्याला अतींद्रियज्ञान आहे व आपल्याला मेलेल्यांच्या आत्म्यांशी संभाषण करता येते, असे तो म्हणे. कँटला या विषयासंबंधी माहित मिळविण्याची इच्छा झाल्यामुळे त्याने स्वीडनबार्जच्या ग्रंथावर सात पौंड<noinclude>{{center|८८}}</noinclude>
2gxb88q8bxdq14bzhdo5p9usrwl919y
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९५
104
110346
230284
230007
2026-05-22T07:49:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230284
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>खर्च केले व आपल्या स्नेह्यांच्या आग्रहावरून त्याने यासंबंधी एक सुरेख ग्रंथ लिहिला. या ग्रंथांत त्याने शास्त्राय तत्वांवर, अशा गोष्टींचे ज्ञान मानवी शक्तीच्या बाहेर आहे, असे आपले मत प्रतिपादन केले. यावरून कँट हा फार बहुश्रुत होता, असे दिसून येईल.<br>{{gap}}कँटमध्ये इतका बहुश्रुतपणा येण्याचे कारण त्याची वाचनाभिरुचि तर खरी, परंतु त्याची कल्पकता व कल्पनाशक्ति या फार दांडग्या होत्या; यामुळेच त्याला इतक्या विषयांचे सोपपत्तिक व साग्र ज्ञान मिळवितां आले. त्याची कल्पनाशक्ति केवढी दांडगी होती, याचा प्रत्यय खालील दोन गोष्टींवरून चांगला येतो.<br>{{gap}}डी क्वेन्सी या इंग्रज ग्रंथकाराने या गोष्टीचे मोठ्या विरोधाभासाने वर्णन केले आहे. तो म्हणतो:- "कँटने एकही पुस्तक आजन्मांत वाचले नाही, असें मी बेलाशक विधान करतों व हे माझे म्हणणे मी शाबीतही करतो! सकृद्दर्शनी हे विधान अगदी खोटे दिसते. ज्याची बहश्रुतपणाबद्दल इतकी ख्याति, तो मनुष्य एकही पुस्तक वाचीत नाही, हे संभवनीय तरी कसे होईल? परंतु कँट हा समग्र पुस्तक केव्हांहि वाचीत नसे. हे अगदी खरे आहे! कोणतेंहि पुस्तक असले म्हणजे ते आपले शब्दशः वाचीत जावयाचे, अशी त्याची रीत नव्हती. तर मधूनमधून तो पुस्तक वाची, काही भाग वाचला म्हणजे त्या पुढे ग्रंथकाराने काय लिहिले असले पाहिजे, हे तो आपल्या कल्पनेने जाणून तो भाग टाकून पुढे जाई. सारांश, तो पुस्तकांतील एकंदर मतलब व नवे विचार तेवढे ध्यानांत धरी; बाकी विषयाचा आपल्या पूर्वीच्या ज्ञानावरून तो अंदाज करी, परंतु अशा अर्धवट वाचनाने त्याचे ज्ञान अर्धवट होई, असे मात्र नाही. तो पूर्वी ठाऊक असलेली माहिती वाचण्यांत वेळ घालवीत नसे, इतकेंच. या त्याच्या वाचनपद्धतीमुळे त्याला बहुश्रुतपणा व विषयवैचित्र्याभिरुचि ही मिळवितां आली."<br>{{gap}}दुसरी त्याच्या कल्पनेची गोष्टही आश्चर्य करण्यासारखी आहे. मागे सांगितलेच आहे की, कँट हा आपले गांव सोडून कचितच जात असे,<noinclude>{{center|८९}}</noinclude>
7nhj5qg1ke78xhd3ma13eam87m5pjx5
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९६
104
110347
230285
230008
2026-05-22T08:01:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230285
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>त्याने कानिग्सबर्जपासून समुद्र जवळ असतांना सुद्धां समुद्र आजन्मांत पाहिला नव्हता! तरी पण त्याला भूगोलाचे ज्ञान फारच असे व त्याची कल्पनाशक्ति इतकी तीव्र होती की तो आपल्या कल्पनेने सर्व विषयांचे स्वरूप आपल्या मनापुढे उभे करीत असे व यामुळे तो हुबेहूब वर्णन करूं शके, एका व्याख्यानांत कँट हा इंग्लंडमधील वेस्टमिनिस्टर पुलाची माहिती सांगत होता. ती माहिती सांगत असतांना त्याने त्या पुलाचें अगदी हुबेहूब वर्णन केले. त्या व्याख्यानाला एक इंग्रज गृहस्थ हजर होता. व्याख्यानाच्या शेवटी त्याने कँटची मुलाखत घेतली व "आपण इंग्लंडांत किती वेळ गेला होतां?" असे त्याने त्याला विचारले. त्यावर "आपण इंग्लंड पााहेलेही नाही," असे त्याने उत्तर दिले. हे ऐकून तो इंग्रज गृहस्थ थक्क झाला. त्याला कांहीं तें खरें वाटेना! कँट जी जी माहिती ग्रंथांवरून व प्रवासवृत्तावरून मिळवी, तिच्याशीं तो आपल्या मनाचे तादात्म्य करून घेई व त्याचे बरोबर स्वरूप मनांत ठेवी. या कल्पनाशक्तीमुळे त्याची भूगोलविषयक व्याख्याने इतकी उत्तम वठत असत, वास्तविक पाहतां भूगोलविषयक पदार्थविज्ञानाला प्रत्यक्ष अवलोकन जास्त पाहिजे, तसेंच लोकांच्या चालीरिती, मनुष्यांच्या प्रकाराच वर्णन, मनुष्यांतील वर्णभेद वगैरे समाजशास्त्रीय गोष्टींना अवलोकन व प्रवासाची जास्त जरूर आहे. कँट हा प्रवासी नसतांना सुद्धा या दोन विषयांत त्याचा हातखंडा असे.<br>{{gap}}जरी कँट कधी प्रवास करीत नसे, तरी त्याची अवलोकनशक्ति सूक्ष्म होती, यांत शंका नाही. त्याने 'सौंदर्य व भव्यता' या विषयावर १७६४ मध्ये एक उत्तम निबंध लिहिला. तो भाषेच्या व मनोरंजकतेच्या दृष्टीने त्याच्या उत्तम ग्रंथांपैकी एक आहे, यांमध्ये कँटची सूक्ष्म अवलोकनशक्ती चांगली दिसून येते.<br>{{gap}}येथपर्यंत कँटच्या बहुश्रुतपणाचे थोडक्यांत विवरण केले, परंतु कँटची कीर्ति मुख्यतः त्याच्या तत्वज्ञानविषयक ग्रंथांवरून झालेली आहे. त्याच्या तात्विक व इतर ग्रंथांविषयींचें थोडक्यांत विवेचन पुढे करावयाचे आहे.<noinclude>{{center|९०}}</noinclude>
9ameaefiaksvmtizbtxnku77bxpemvt
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९७
104
110348
230286
230009
2026-05-22T08:05:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230286
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>येथे त्याच्या विचारांचा एकंदर युरोपवर कसा परिणाम झाला, एवढे सांगणे अवश्य आहे; तथापि तें करण्यापूर्वी त्याच्या राहणींतील व त्याच्या विशेष संवयींतील एकदोन गोष्टी सांगून हा विषय संपवू.<br>{{gap}}कँटला आपल्या नित्य व्यवहारांत व नियमितपणांत व्यत्यय आलेला कधीच सहन होत नसे. एकदां कँट एका मोठ्या सरदाराच्या अत्याग्रहावरून त्याच्या गाडीतून बाहेर गेला; परंतु त्यामुळे त्याला त्या सरदाराच्या तब्बेतीप्रमाणे गाडीतून सावकाश व लांब वळसे घेऊन जावे लागले, व तेणेकरून त्याच्या ठरलेल्या कार्यक्रमांत बिघाड झाला. तेव्हांपासून कँटनें असा नियम केला, की, ज्या गाडीवर आपली पूर्णपणें हुकमत नाही, त्या गाडीत कधीही बसावयाचें नाहीं!<br>{{gap}}कँट बारिकसारिक गोष्टीकडेहि लक्ष्य देत असे. त्याच्या खोलीतील व्यवस्थेत फरक झालेला त्याला चालत नसे. तसेंच, नोकराकडून बरोबर काम झालेच पाहिजे, अशी त्याची सक्ती असे. त्याचा नोकर लँपी हा जरा शिथिल स्वभावाचा होता; परंतु तो कँटची तरतूद नीट राखीत असे. पुढे पुढे तो फारच अनियमित बनला व त्यामुळे कँटला त्याला काढून टाकावे लागले.<br>{{gap}}कँटला शब्दांचे उच्चार व नांवाचे उच्चार कोणी चुकीचे केल्यास तें मुळीच खपत नसे. परंतु लँपी तर मृत्पिंडबुद्धि असल्यामुळे तो अशा चुका नेहमी करी, व कँट त्याला पढवीत असे. त्यामुळे कँटकडे येणाऱ्या पाहुण्यांस एक प्रकारचा फार्स नेहमी पहावयास सांपडे. कँटकडे हार्टंगचें वर्तमानपत्र नेहमी येत असे; परंतु लँपी या नांवाबद्दल नेहमी चूक करी. लँपी म्हणे "प्रोफेसरसाहेब हे हार्टमनचे वर्तमानपत्र घ्या." यावर कँट म्हणे "काय? तू काय म्हणतोस? हार्टमनचे वर्तमानपत्र? मी तुला सांगतों, हार्टमन नव्हे, हार्टंग! आतां माझ्याप्रमाणे म्हण पाहूं- हार्टमन नव्हे हार्टंग" लँपी एकाद्या फलटणीतील शिपायाप्रमाणे एकसारख्या स्वराने ते शब्द उच्चारी. त्याच्याकडून कँट असें त्रिवार म्हणून घेई, व ज्या ज्या वेळी तें वर्तमानपत्र (आठवड्यांतून दोनदां) येई, त्या त्या<noinclude>{{center|९१}}</noinclude>
m9z3b1pyha1upnehqaree5tmz1iuk5g
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९८
104
110349
230287
230010
2026-05-22T08:09:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230287
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>वेळी लँपीने हटकून ही चुकी करावयाची, व कँटने त्याचेकडून संथा घेववावयाची! हा क्रम कित्येयकतरी वर्षे चालला होता. तरी शेवटपर्यंत लँपीच्याने चूक सुधारली नाही व कँटलाहि या संथा देण्याचा कंटाळा आला नाही.<br>{{gap}}आतां कँटच्या चरित्रांतील बाह्यांग सोडून अंतरंगाकडे वळू या. कारण कँटचे सर्व चरित्र मुळी चिन्मय आहे. त्याचे अवतारकार्य मनुष्यामध्ये विचारक्रांति करण्याचे होते, व ते त्याच्या लेखांनी पूर्णपणे घडवून आणले. कँटला सत्यज्ञानाची फार आवड होती. लोकांमधील अंधश्रद्धा नाहींशी होऊन लोक विचारी व सदाचरणी व्हावे, असाच त्याचा हेतु होता. त्याच्या नीतिविषयक ग्रंथांचा परिणाम लोकमतावर फारच झाला. त्याचकाळी युरोपमध्ये सुखलालसा व विषयसुखेच्छा फार झाली होती, मनुष्याची इतिकर्तव्यता म्हणजे सुख मिळविणे, अशा प्रकारचे विचार फार पसरलेले होते. त्याविरुद्ध कँटच्या लेखांचा रोख होता. मनुष्याने सुखेच्छा सोडून सदसद्विवेकबुद्धीप्रमाणे करावे, असे कँटचे मत होते. कर्तव्य कर्तव्यबुद्धीने केले पाहिजे, हीच मानवी इतिकर्तव्यता, असे तो प्रतिपादन करीत असे, व कँटचा आयुष्यक्रम या त्याच्या मताप्रमाणेच असे. 'बोले तैसा चाले' या कोटीपैकी कँट हा होता. त्याला भितरेपणा हा ठाऊकच नव्हता! जे आपल्याला योग्य वाटेल तें स्पष्टपणे बोलण्यास व लिहिण्यास तो कधीच कचरत नसे. ईश्वरावर त्याचा भरंवसा होता, परंतु कर्मकांडावर त्याचा मुळींच विश्वास नसे. तो प्रार्थनांमंदिरांत प्रार्थनेला कधींहि जात नसे. रेक्टर या नात्याने त्याला कॉलेजांतील विद्यार्थ्यांना मदिरांत न्यावे लागे, त्या वेळी तो मंदिराच्या दारापर्यंत विद्यार्थ्यांना घेऊन जाई व स्वतः तेथूनच परत जाई. त्याच्या मताप्रमाणे मनुष्याची सर्व वागणूक हीच मुळी प्रार्थना होय. मनुष्याने सर्व व्यवहारांत आपले कर्तव्य बजावले, म्हणजे ईश्वराची खरी भाक्ति झाली, असे तो समजत असे.<br>{{gap}}कँटच्या असल्या धर्ममतांबद्दल व ती मते एका ग्रंथांत प्रतिपादन<noinclude>{{center|९२}}</noinclude>
kpk1gzd90t16vfferpj4vclsrb0lq6e
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९९
104
110350
230288
230011
2026-05-22T08:12:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230288
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>केल्याबद्दल कँटवर जर्मन सरकारचा रोष झाला. कँटने आपल्या वर्तनाने आपल्या मताचे समर्थन केले; परतु सरकारच्या मर्जीखातर महाराजांचा राजनिष्ठ प्रजाजन या नात्याने मी या पुढे या विषयावर लिहिणार नाही व बोलणार नाही, असे त्याने लिहून दिले, 'महाराजांचा राजनिष्ठ प्रजाजन' म्हणजे 'त्यावेळच्या राजाच्या हयातीपर्यंतचे आपले अस्तित्व' असा कँटने अर्थ मनांत धरला होता, व त्या राजाच्या मरणानतर त्याने धर्मविषयक एक ग्रंथ प्रसिद्ध केला. याप्रसंगी कँटच्या हातून चूक झाली, असे म्हणणे भाग आहे. या वेळी 'नरो वा कुंजरो वा' अशाच प्रकारचे कँटचे वर्तन झाले, असे म्हणणे प्राप्त आहे. जो गृहस्थ आपल्या लेखणीत व लेखांत इतका विलक्षण धीट होता, तोच राजा पुढे भ्याला, असे याप्रसंगी वाटल्याखेरीज रहात नाही. परंतु ‘एको हि दोषो गुणसंन्निपाते निमज्जतीन्दोः किरणेष्विवाहकः' या न्यायाने कँटच्या एकंदर उदात्त चरित्रांत हा एक कमीपणा पार नाहीसा होतो. कँट इ. १८०४ मध्ये मृत्यु पावला.{{nop}}<noinclude>{{center|९३}}</noinclude>
7zk9cw5zwydvljow5j62s567w0osu5m
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१००
104
110351
230289
230012
2026-05-22T08:22:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230289
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|(२)<br>'''कँटच्या पूर्वीचे तत्त्वज्ञान'''}}}}<br>
{{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}
{{gap}}कँट आपल्या इच्छेविरुद्ध नाइलाजाने तत्त्वज्ञानी बनला, असे म्हटले तरी चालेल. कॉलेजमध्ये त्याचे आवडते विषय म्हणजे गणित, ज्योतिषशास्त्र व इतर आधिभौतिक शास्त्रे. त्याने इंग्लंडांतला प्रसिद्ध गणिती व ज्योतिषी न्यूटन याच्या ग्रंथांचे आस्थेनें व काळजीपूर्वक अध्ययन केले होते; नव्हे त्याने आकाशांतील तारागणांसंबंधी एक ग्रंथ लिहून त्यांत सूर्यमालेच्या उत्पत्तीची न्यूटनच्या आकर्षणतत्त्वाच्या आधारे एक उपपत्ति बसविली होती. त्याचे काळी सर्व आधिभौतिक शास्त्रांची झपाट्याने वाढ होत होती व कँटने या सर्व शास्त्रांतील नवीन शोधांची माहिती करून घेतली होती. गणितशास्त्राचे सिद्धांत व आधिभौतिक शास्त्रांतील नियम हेच काय ते सत्यस्वरूप व खात्रीचे मानवी ज्ञान होय अशी कँटची समजूत होती. कारण हे सर्व ज्ञान अनुभवाच्या व संवेदनांच्या आधारावर उभारलेले असल्यामुळे त्याचा पाया भरभकम आहे असे कँटला वाटे. कॉलेजांत असतांना कँटने जर्मन युनिव्हर्सिटीत शिकविले जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला होता. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञानी लेबनिटझ याच्या तत्त्वज्ञानविषयक विचारांना व्यवस्थित पण संकुचित सूत्रमय असे स्वरूप वुल्फ या तत्त्वज्ञान्याने दिले होते; ते तत्त्वज्ञान कँटच्या वेळी त्याचे युनिव्हर्सिटीत शिकविले जात असे व म्हणूनच युनिव्हर्सिटीत असतांना कँटला तें शिकावे लागले होते. पण या तत्त्वज्ञानाबद्दल त्याला फारशी खात्री वाटत नसे. हे तत्त्वज्ञान कच्या पायावर उभारलेले आहे असें त्याला वाटे. सारांश, तरुण वयांत कँटचा सर्व भर आधिभौतिक ज्ञानावर होता. मानवी ज्ञानांत जर कोणतें ज्ञान निश्चित, त्रिकालाबाधित व सर्वथा सत्यमय<noinclude>{{center|९४}}</noinclude>
b78xmvf2p4eoznri0g2tz9i8vai9okn
230290
230289
2026-05-22T08:23:12Z
कल्पनाशक्ती
3813
230290
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|{{xx-larger|(२)<br>'''कँटच्या पूर्वीचे तत्त्वज्ञान'''}}}}
{{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}
{{gap}}कँट आपल्या इच्छेविरुद्ध नाइलाजाने तत्त्वज्ञानी बनला, असे म्हटले तरी चालेल. कॉलेजमध्ये त्याचे आवडते विषय म्हणजे गणित, ज्योतिषशास्त्र व इतर आधिभौतिक शास्त्रे. त्याने इंग्लंडांतला प्रसिद्ध गणिती व ज्योतिषी न्यूटन याच्या ग्रंथांचे आस्थेनें व काळजीपूर्वक अध्ययन केले होते; नव्हे त्याने आकाशांतील तारागणांसंबंधी एक ग्रंथ लिहून त्यांत सूर्यमालेच्या उत्पत्तीची न्यूटनच्या आकर्षणतत्त्वाच्या आधारे एक उपपत्ति बसविली होती. त्याचे काळी सर्व आधिभौतिक शास्त्रांची झपाट्याने वाढ होत होती व कँटने या सर्व शास्त्रांतील नवीन शोधांची माहिती करून घेतली होती. गणितशास्त्राचे सिद्धांत व आधिभौतिक शास्त्रांतील नियम हेच काय ते सत्यस्वरूप व खात्रीचे मानवी ज्ञान होय अशी कँटची समजूत होती. कारण हे सर्व ज्ञान अनुभवाच्या व संवेदनांच्या आधारावर उभारलेले असल्यामुळे त्याचा पाया भरभकम आहे असे कँटला वाटे. कॉलेजांत असतांना कँटने जर्मन युनिव्हर्सिटीत शिकविले जाणाऱ्या तत्त्वज्ञानाचाही अभ्यास केला होता. प्रसिद्ध जर्मन तत्त्वज्ञानी लेबनिटझ याच्या तत्त्वज्ञानविषयक विचारांना व्यवस्थित पण संकुचित सूत्रमय असे स्वरूप वुल्फ या तत्त्वज्ञान्याने दिले होते; ते तत्त्वज्ञान कँटच्या वेळी त्याचे युनिव्हर्सिटीत शिकविले जात असे व म्हणूनच युनिव्हर्सिटीत असतांना कँटला तें शिकावे लागले होते. पण या तत्त्वज्ञानाबद्दल त्याला फारशी खात्री वाटत नसे. हे तत्त्वज्ञान कच्या पायावर उभारलेले आहे असें त्याला वाटे. सारांश, तरुण वयांत कँटचा सर्व भर आधिभौतिक ज्ञानावर होता. मानवी ज्ञानांत जर कोणतें ज्ञान निश्चित, त्रिकालाबाधित व सर्वथा सत्यमय<noinclude>{{center|९४}}</noinclude>
dadrugqwoszrb73z2isrxfhiy5y9gww
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०१
104
110352
230291
230013
2026-05-22T08:29:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230291
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>असेल तर ते अनुभव व संवेदना यांनी दिलेले आधिभौतिक शास्त्रांतील ज्ञान होय अशी त्याची दृढ श्रद्धा होती. अशा मनःस्थितीत असतां इंग्रजी तत्ववेता ह्यूम याचे संशयवादी ग्रंथ कँटचे हाती पडले, ह्यूमनें आपल्या ग्रंथांत अनुभव व संवेदन या ज्ञानाच्या आधाराचे दोष दाखवून मानवी प्राण्याला कोणतेंहि ज्ञान शक्य नाही व म्हणून संशयवाद शेवटी शिल्लक राहतो असें प्रस्थापित केले होते. हे ग्रंथ वाचून 'आपण श्रद्धेच्या झोपेतून जागे झालो' असे कँटने म्हटले आहे. मानवी प्राण्याला ज्ञान मिळविणे शक्य आहे व गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांमध्ये सत्य ज्ञान आहे अशी कँटची मनोदेवता त्याला सांगत होती. ह्यूमचे म्हणणे खरें धरले तर सर्व ज्ञान टाकाऊ ठरते. तेव्हा हे गौडबंगाल काय आहे; तत्त्वज्ञान्यांची कोठे तरी मोठी घोडचूक होत असावी; तेव्हां ती घोडचूक शोधून काढणे- गणित व आधिभौतिक शास्त्रांच्या समर्थनार्थ तरी-आवश्यक असे कँटला वाटून त्याने तत्त्वज्ञानाचा प्रश्न हाती घेऊन त्याचा आरंभापासून तलास लावण्याचा विडा उचलला व त्याचेच फल म्हणजे कँटचे परीक्षणात्मक तत्त्वज्ञान होय. म्हणूनच कँटचे तत्त्वज्ञान समजण्यास युरोपच्या अर्वाचीन काळच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाची थोडीशी तरी माहिती असणे अवश्य आहे. तरी या तत्त्वज्ञानाचे येथें किंचित् सिंहावलोकन करूं.<br>{{gap}}युरोपांतल्या अर्वाचीन युगाला, विद्येच्या पुनरुज्जीवनापासून सुरवात झाली. त्या पूर्वीच्या काळाला मध्ययुग किंवा अज्ञानयुग म्हणतात. या विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या योगें युरोपांत सर्व शास्त्रांची झपाट्याने प्रगति होऊ लागली, त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाचाही उद्भव झाला. मनुष्याला ज्ञान मिळणे शक्य आहे काय? हाच तत्त्वज्ञानाचा मुख्य प्रश्न पुढे आला. कारण मध्ययुगीन कल्पनेप्रमाणे बायबल व मान्य केलेले इतर ग्रंथ यांपलीकडे ज्ञानच नाही; मानवी बुद्धीचे काम म्हणजे या ग्रंथांचे विवेचन करणे इतकेच आहे; मानवी बुद्धीला नवीन ज्ञान होणे शक्य नाही, अशी मध्ययुगीन लोकांची समजूत होती. विद्येच्या पुनरुज्जीवनाने या समजुतीला जबरदस्त धक्का बसला व म्हणूनच मानवी ज्ञानाचा प्रश्न<noinclude>{{center|९५}}</noinclude>
7p3y1ce2tq6arxmh893jvc7vkkuaaft
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०२
104
110353
230292
230014
2026-05-22T08:34:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230292
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>महत्त्वाचा बनला. या मानवी ज्ञानाची मीमांसा बेकन व डेकार्ट या दोन तत्त्वज्ञान्यांनी निरनिराळ्या तऱ्हेने केली.<br>{{gap}}बेकन संवेदनावादाचा जनक बनला. त्याचे मते मनुष्याचे सर्व ज्ञान त्याला इंद्रियद्वारा होतें, बाह्य पदार्थाचे प्रतिबिंब आपल्या इंद्रियांवर पडते. इंद्रिये मनावर संवेदना उत्पन्न करतात व या संवेदनांनी सत्य ज्ञान होते. मानवी मन हे आरशासारखे आहे. आरसा ज्याप्रमाणे स्वच्छ व मलरहित असला म्हणजे त्यावर पदार्थाचें प्रतिबिंब यथार्य उठते, त्याचप्रमाणे मनामध्ये पूर्वग्रह- कल्पनाशक्तीने किंवा केवल विवेकाने उभारलेले विचार- नसले म्हणजे संवेदनांचा ठसा मनावर यथार्थ उमटतो. तरी सृष्टिज्ञानाला शुद्ध व निर्विचार मन पाहिजे. मानवी कल्पना शक्तीने व विवेकशक्तीने उत्पन्न केलेले विचार हे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आहेत, असे बेकनने म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे कोळी आपल्याच अंगापासून चीक काढून त्याच्या धाग्याचे सुंदर जाळे बनवितो, पण ते एका फुकरासरसें तुटून जाते, त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीने व केवळ विवेकशक्तीने उभारलेले विचारांचे डोलारे अनुभवाने मोडले जातात, सारांश, बेकनच्या मते मानवी मनाची संवेदनशक्ति हीच खरें ज्ञान देणारी शक्ति होय. कल्पनाशक्ति व विवेकशक्ति या ज्ञानाभास देणाऱ्या शक्ति होत. तरी मनुष्यांनी पहिल्या शक्तीवर विसंबले पाहिजे; तर मनुष्याला सत्यज्ञान होईल. या मताच्या योगे बेकन हा संवेदनावादाचा जनक बनला.<br>{{gap}}डेकार्ट या फ्रेंच तत्त्वज्ञान्याने दुसराच पंथ काढला, मला कोणत्या गोष्टीचे खात्रीचे ज्ञान आहे? या प्रश्नापासून त्याने तत्त्वज्ञानाला सुरवात केली. त्याचे मते आपली इंद्रिये आपल्याला फसवितात; कारण ती पुष्कळ वेळां ज्ञानाचा आभास मनांत उत्पन्न करतात. आपल्याला दृष्टिभ्रम होतो, श्रुतिभ्रम होतो. तेव्हां बाह्य सृष्टीचे खरे ज्ञान आपल्याला होत नाही. तसेंच गणितशास्त्रांतील प्रमेयें तरी खरी कशावरून असा आपल्याला संशय येतो. सारांश; ज्ञानासंबंधी आपण विचार करू लागलों म्हणजे 'मला सर्व गोष्टींबद्दल संदेह वाटतो' अशा विधानाला आपण येऊन पोचतो.<noinclude>{{center|९६}}</noinclude>
snjdhpyb90t9ngsp7tlcjc6fygkge64
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०३
104
110354
230293
230015
2026-05-22T08:39:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230293
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>पण या संदेहात्मक विधानांत एका पदार्थाबद्दल संदेह राहत नाही. तो पदार्थ म्हणजे अहंभावरूप आत्मा अगर मन. संदेह वाटण्याला सुद्धा 'संदेही' अस्तित्वांत पाहिजे. तेव्हां 'मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वांत आहे' हे मोठे प्रमेय या संदेहपद्धतींतून निघते. अहंभावाची जाणीव असलेल्या आत्म्याच्या अस्त्विाबद्दलचे पहिले सत्य आपल्याला निश्चितपणे कळतें. आतां या सत्यापासून आणखी सत्ये निष्पन्न होतात. आत्म्याच्या संदेहवृत्तीपासून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होते. पण संदेहवृत्ति- आत्मा म्हणजे अपूर्ण सदोष आत्मा होय. पण अपूर्ण व सदोष आत्मा ही कल्पना सापेक्ष आहे. ती कळण्याकरता 'संपूर्ण व दोषरहित आत्मा' ही कल्पना कळावीच लागते. पण ही दुसरी कल्पना म्हणजेच सर्वगुणसंपन्न परमेश्वराची कल्पना होय. तेव्हां जीवात्मा व परमात्मा अशा दोन कल्पना आपल्याला कळल्या. त्यांपैकी जीवात्म्याच्या अस्तित्वाची खात्री झालीच आहे. आतां परमात्म्याच्या अस्तित्वाची खात्री खालील प्रमाणाने पटते. सर्वगुणसंपन्न परमात्मा अस्तित्वात असलाच पाहिजे. कारण जर तो अस्तित्वांत नसेल तर तो सर्वगुणसंपन्न होणार नाही. कारण अस्तित्व हा गुण त्याच्यामध्ये नाही असे होईल. या विचारसरणीने सृष्टीतील दोन पदार्थ सिद्ध झाले. आतां राहिली बाह्य सृष्टि. हिचे अस्तित्वही सिद्ध करता येते. परमात्मा सर्वगुणसंपन्न आहे. या गुणांमध्ये 'सचोटी' हा गुण येतो. तेव्हां सर्वगुणसंपन्न परमेश्वर दुसऱ्यास फसविणार नाही. म्हणूनच आपल्या इंद्रियांना ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्या सत्यमय असल्या पाहिजेत. नाही तर परमेश्वराने आपल्याला भ्रमविणारी इंद्रिये देऊन फसविले असे होईल. याप्रमाणे तत्त्वज्ञानाचे तीन पदार्थ सिद्ध झाले. जीवात्मा, परमात्मा व जड सृष्टि परमात्मा हा पूर्ण असून त्यानेच जीवात्मे व जड सृष्टि निर्माण केली. जीवात्मे व जड सृष्टि यांचे गुण परस्परविरोधी आहेत. जीवात्मा विवेकवान् व अवकाशरहित पदार्थ आहे तर जड सृष्टि ही विवेकरहित व अवकाश व्यापणारी आहे. याप्रमाणे डेकार्टचे तत्त्वश्पन आहे. या तत्त्व-<noinclude>{{center|९७}}
<br>{{gap}}सा...७</noinclude>
ba8fr0z5ypu9lhww14yx8iywrerxxfs
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०४
104
110355
230294
230016
2026-05-22T08:43:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230294
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>ज्ञानाचा विशेष म्हणजे त्यांत मानवी मनाच्या विवेकावर सर्व भर टाकलेला आहे. म्हणूनच डेकार्ट हा विवेकवादाचा जनक बनला.<br>{{gap}}डेकार्टचे तत्त्वज्ञान स्पायनोझा याने परिपूर्णतेस आणिलें. साधारणतः यासारख्याच मतांचा पुरस्कार लायबनिट्स या जर्मन तत्त्वज्ञान्याने केला व लायबनिटझच्या मतांचा व्यवस्थित संग्रह वुल्फ या तत्त्वज्ञान्याने केला व हेच तत्त्वज्ञान कँटच्या काळी जर्मन युनिव्हर्सिटींत प्रचलित होते. हे मागे एकदां सांगितलेच आहे.<br>{{gap}}बेकनने प्रारंभ केलेल्या संवेदनावादाकडे आता वळणे जरूर आहे. बेकन हा तत्त्वज्ञानी म्हणून फारसा प्रसिद्ध नाही. संवेदनावादाचा खरा पुरस्कर्ता लॉक हा इंग्रज तत्त्वज्ञानी होय. त्याने सर्व ज्ञान संवेदनांनी मिळते असे प्रतिपादन केले. विवेकशक्तीचाही त्याने उल्लेख केला आहे. पण ज्ञानाच्या बाबतीत विवेकाचे काम गौण आहे असे त्याचे म्हणणे आहे. सर्व ज्ञानाचें मूळ संवेदनांत आहे. संवेदनांनी काही ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाच्या संयोगाने आणखी ज्ञान विवेकाला काढता येईल. पण सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे असे लॉकचे म्हणणे आहे. त्याचे मतें प्रारंभी मानवी मन कोऱ्या कागदासारखे असते. त्यावर संवेदनांनीच प्रथमतः संस्कार होतात व त्यांपासून मग पुढे विचार बनतात. डेकार्टप्रमाणे लॉकही सृष्टीत तीन पदार्थ आहेत असे मानीत असे. इंद्रियांनी दिलेल्या संवेदनांनी आपल्याला बाह्य सृष्टि कळते. म्हणजे बाह्य सृष्टीचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे. आत्म्याचे ज्ञान आपल्या सर्व जाणीवेत व संवेदनांत प्रतीत होते असे डेकार्टप्रमाणेच लॉक म्हणे. ईश्वराचे ज्ञान आपल्याला अनुमानाने होते असे तो म्हणे; ते येणेप्रमाणे:--<br>{{gap}}ही सृष्टि व मानवी प्राणी ही कार्ये होत. आतां या कार्यांना कोणी तरी कर्ता पाहिजे व तो कर्ता सर्वशक्तिमान व सर्वज्ञ असा असला पाहिजे. तो अर्थात् परमेश्वरच होय. लॉकच्या पुढची संवेदनवादाची पायरी बार्क्लेनें गांठली. त्याने तर सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे व म्हणून बाह्य जगच मुळीं मानतां येत नाही असे दाखविले. पण या पुस्तकांत<noinclude>{{center|९८}}</noinclude>
106w1k5kk0m28slch2lwwwhbdtv8bhl
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०५
104
110356
230295
230017
2026-05-22T08:47:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230295
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>बार्क्लेंच्या तत्वज्ञानाची हकीकत आलीच आहे. तेव्हां त्याची येथे पुनरावृत्ति करण्याचे कारण नाही.<br>{{gap}}ह्यूमने संवेदनावादाचा अंत संशयवादांत कसा होतो हे स्पष्ट करून दाखविले. त्याने प्रथमतः तीन पदार्थाबद्दल संशय प्रदर्शित केला. त्याचे म्हणणे हे की, बार्क्लेने दाखविलेल्या ज्या कारणाकरितां आपल्याला जड सृष्टीचे अस्तित्व मानतां येत नाही त्याच कारणाकरितां आत्मा व परमात्मा यांचेही अस्तित्व मानतां येत नाही. कारण संवेदनांच्या मागे काही तरी 'जड पदार्थ' आहे असे आपल्याला सांगता येत नाही, तर मनाच्या संवेदना, कल्पना, विचार, वासना व विकार- मनाचे सर्व व्यापार यांच्या मागें आत्मा आहे असें तरी कसे सांगतां येईल? व जड सृष्टि व आत्मा हे पदार्थ संशयास्पद ठरल्यावर परमात्मा या पदार्थाच्या अस्तित्वाला तरी आधार काय? तोही संशयास्पद ठरतो.<br>{{gap}}याप्रमाणे ह्यूमने तत्त्वज्ञानाच्या पदार्थत्रयावर घाला घातला. पण तो येथेच थांबला नाही. आधिभौतिक शास्त्राचा पाया जी 'कार्यकारणाची कल्पना' त्या कल्पनेवर ह्यूमने घाव घालण्यास सुरवात केली. बेकन, लॉक किंवा बार्क्ले या संवेदनावादी तत्त्वज्ञान्यांनी कार्यकारणभावाची कल्पना गृहीतच धरली होती. लॉकच्या मते ती कल्पना आपल्या इतर शास्त्रीय कल्पनांप्रमाणे आपल्याला अनुभवाने-संवेदनांनी कळते. येथेच ह्यूमने लॉकची घोडचूक दाखविली. ह्यूमचे म्हणणे असे की, कार्यकारण भावाचा विचार ही कल्पनाशक्तीची भ्रांति आहे. ती संवेदनांनी समजणे शक्यच नाही. कारण, संवेदना एकामागून येतात, एवढेच संवेदना सांगू शकते; एक बिलियर्ड गोटी हालल्यानंतर दुसरी हलते, उष्णतेची संवेदना झाल्यावर भाजल्याची संवेदना होते. पण एक गोटी दुसऱ्या गोटीच्या गतीचे कारण हे काही आपण पहात नाही. तसेच उष्णता हे भाजल्याचे कारण हे कांही आपण पहात नाही. उष्णता व भाजणे ही पुष्कळ वेळां एका मागून एक आली म्हणजे आपल्याला त्यामध्ये जास्त निकट संबंध आहे असा नुसता भास होतो; परंतु संवेदनांमध्ये निकट<noinclude>{{center|९९}}</noinclude>
0xwyttsuwl4fyi4nx320a1h3fua3x4v
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०६
104
110357
230296
230018
2026-05-22T11:23:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230296
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>संबंध उत्पन्न होत नाही; तर जो कल्पनासंगतीच्या तत्वानुरूप आपल्या केवळ मनांत उत्पन्न होतो. तेव्हां आपल्याला संवेदनांनी जे बाह्य सृष्टीचे ज्ञान होते ते अगदी विस्कळीत असते. त्यांत संबंधकल्पना येत नाही. म्हणून कार्यकारणाची भावना हा निवळ मानवी कल्पनेचा भ्रम आहे. त्यांत सत्यांश मुळीच नाही. याप्रमाणे ह्यूमने कार्यकारण भावाच्या कल्पनेवर घाला घातला व ती कल्पना भ्रममूलक आहे असे दाखविले. या योगें कार्यकारण भावाच्या तत्वावर उभारलेली सर्व आधिभौतिक शास्त्रांची इमारत पार ढासळली. ह्यूमच्या मताप्रमाणे पदार्थत्रय संशयास्पद झाले; कार्यकारणभाव भ्रमरूप झाला. अर्थात् शास्त्राचा सर्व पायाच गेला व अशा तऱ्हेनें ह्यूमने संवेदनावादाचा संशयवादांत शेवट करून दाखविला.<br>{{gap}}मानवी मनाला ज्ञान असाध्य आहे व म्हणूनच संशयवाद खरा ही कल्पना कँटच्या मनाला मुळीच सहन होईना. तरुण वयापासून त्याचा सर्व भर आधिभौतिक शास्त्रांवर, ती शास्त्रेही ह्युमच्या तत्वज्ञानाने जेव्हां विलयास जाऊ लागली, तेव्हां कँटचे मन गोंधळून गेले. त्याची मनोदेवता त्याला सांगे की गणित व भौतिक शास्त्र या द्वयीमध्ये तरी सत्य ज्ञान आहे खास. पण तत्वज्ञानाच्या पंथाप्रमाणे तर या ज्ञानावर पाणी सोडण्याची पाळी आली. तरी पूर्वीच्या तत्वज्ञानाची कोठे तरी भयंकर भूल होत असली पाहिजे असे कँटच्या मनाने घेतले. व म्हणूनच त्याने तत्वज्ञानाचा प्रश्न मूळापासून स्वतंत्रपणे सोडविण्याचा निश्चय केला व त्या निश्चयाचे फळ म्हणजेच कँटचे परिक्षणात्मक तत्वज्ञान होय. तेव्हां आतां त्या कँटच्या तत्वज्ञानाकडेच आपण वळणे बरे.
{{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}{{nop}}<noinclude>{{center|१००}}</noinclude>
5fpj3tmwiwsbxaqya896iodnf2fa5so
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०७
104
110358
230297
230019
2026-05-22T11:35:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230297
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br>
{{center|{{xx-larger|(३)<br>'''कँटचे तत्त्वज्ञान.'''}}}}
{{rule|7em}}
{{gap}}पूर्वीच्या सर्व तत्वज्ञानापासून आपल्या तत्त्वज्ञानाचा फरक दाखविण्याकरतां कँटने आपल्या तत्वज्ञानाला 'परीक्षणात्मक तत्वज्ञान' असें नवीन नांव दिले आहे व ते त्याने तीन ग्रंथांत ग्रथित केले आहे. या ग्रंथांची नांवेंही दुर्बोध अशी आहेत. प्रथमतः त्याने 'शुद्ध विवेकाचे परीक्षण' या नांवाचा ग्रंथ लिहिला. हाच त्याच्या तत्वज्ञानाचा मूळ ग्रंथ होय. यामध्ये कँटने आपली नवी ज्ञानमीमांसा इचे विवेचन केले. नंतर त्याने 'सदसद्विवेकाचे परीक्षण' म्हणून दुसरा ग्रंथ लिहिला. यांत त्याचे नीतिशास्त्रविषयक विचार आलेले आहेत. शेवटी त्याने 'भावनेचे परीक्षण' नांवाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कँटच्या तत्वज्ञानरूपी कमानीचा जणू कांही मधला चिराच आहे. यामध्ये आपल्या पहिल्या दोन ग्रंथांतील विचारांचा मेळ घालून कँटने त्यावर नवीन विचारांचा मुगुटमणी चढविला आहे. हे तीन ग्रंथ म्हणजे मानवी मनाच्या तीन प्रमुख शक्ति- विवेकशक्ति, इच्छाशक्ति व भावनाशक्ती- यांचे विवेचन आहे असे म्हटले तरी चालेल. आतां क्रमाने या तीन ग्रंथांचे थोडक्यांत सार सांगू या.<br>{{gap}}कँटने कॉलेजांत असतांनाच वुल्फच्या विवेकवादी तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. या मताचे म्हणणे हे की, सर्व मानवी ज्ञान विवेकानें होते. पण त्याच वेळी विवेकशक्तीचा कमतरपणा कँटच्या मनांत आला होता. विवेकशक्ति ही पृथक्करणात्मक शक्ति आहे; ती विधायक शक्ति नाहीं. विवेक विचारांचे पृथक्करण करून त्यांतून अनुमानाने सिद्धांत काढील. परंतु विवेकानें नवीन ज्ञान कधीही होणार नाही. विवेकाला प्रथमतः पुष्कळसे सिद्धांत गृहीत धरावे लागतात व त्या सिद्धांतांच्या साहाय्याने<noinclude>{{center|१०१}}</noinclude>
c8vutd3wu43tht2rsyv0p2ezww95rf8
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०८
104
110359
230298
230021
2026-05-22T11:45:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230298
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /><u>'''तीन तत्वज्ञानी.'''</u></noinclude>उपसिद्धांत विवेक काढतो. तेव्हां सर्व ज्ञान विवेकानें होते हे म्हणणे बरोबर नाही असें कँटला वाटत असे. त्या वेळी हे गृहीत धरलेले सिद्धांत अनुभवाने कळतात असें त्याला वाटे, पण ह्यूमनें अनुभवाने सिद्धांत निघत नाहीत असे दाखविण्याचा प्रयत्न केला. याप्रमाणे सर्व ज्ञान संशयास्पद होऊ लागले. म्हणूनच कँटनें मानवी ज्ञान कसें होतें हाच प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे त्याने चार विभाग केले व आपल्या ग्रंथांच्या चार भागांत त्यांचे विवेचन केले. मानवी ज्ञानाचे स्थूल मानाने तीन शास्त्रांमध्ये वर्गीकरण करता येते. गणित, आधिभौतिक शास्त्रे किंवा सृष्टिशास्त्र आणि तत्वज्ञान, गणित व सृष्टिशास्त्रे ही अस्तित्वांत असून त्यांची सारखी प्रगति होत आहे ही निर्विवाद गोष्ट आहे असें कँटचे म्हणणे होते. तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दल मात्र शंका आहे. कारण त्यांत सर्वसंमत अशी प्रमेयेंच दृष्टीस पडत नाहीत. म्हणून विचार करावयाचे प्रश्न हे होत.<br>{{gap}}१ गणितशास्त्र का व कसे शक्य आहे?<br>{{gap}}२ सृष्टि शास्त्र का व कसे शक्य आहे?<br>{{gap}}३ तत्त्वज्ञान शक्य आहे का? व शक्य नसल्यास मानवी मनाची तत्त्वज्ञानविषयक स्वाभाविक प्रवृत्ति का आहे?<br>{{gap}}४ कोणत्या पायावर नवीन तत्वज्ञान बनविता येईल.?<br>{{gap}}कँटच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथांत या चार प्रश्नांची चार भागांत उत्तरें आलेली आहेत. ही उत्तरे देतांना कँटच्या मनापुढे विवेकवाद व संवेदनावाद हे एकांगीवाद सारखे आहेत व त्यांना उद्देशूनच जणू काही कँटने या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याचा प्रथमतः ओढा संवेदनावादाकडे होता व म्हणून त्या वादाच्या म्हणण्यापासून सुरवात करून कँटनें त्या वादाचा कमतरपणा दाखवून हळुहळू आपल्या परीक्षणात्मक तत्वज्ञानाकडे वाचकांना ओढीत नेलें आहे.<br>{{gap}}सर्व मानवी ज्ञानाला संवेदनांपासून सुरवात होते हे खरे आहे. पण त्यावरून सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे हे मात्र खरे नाही. संवेदना ही<noinclude>{{center|१०२}}</noinclude>
r1e0pvcvt665p2gylkehhf4a2b1u38n
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०९
104
110360
230300
230022
2026-05-22T11:56:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230300
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|<u>'''कँट'''</u>}}</noinclude>ज्ञानाचे एक अंग आहे. त्या अंगाला बुद्धीच्या व्यापाराची जोड झाल्याखेरीज त्याला ज्ञानरूप प्राप्त होत नाही. तेव्हां बुद्धीचे अंग ज्ञानाला आवश्यक आहे व ज्ञान हे संवेदना व विचार (बुद्धीचे कार्य) यांच्या संयोगापासून होते असे कँटने प्रतिपादन केले आहे व प्रथमतः संवेदनांत बुद्धीचा अंश कसा आहे हे पहिल्या भागांत दाखवून दिले आहे.<br>{{gap}}बाह्य पदार्थांपासून इंद्रियद्वारा आपल्याला संवेदना होतात असे आपण म्हणतो. या संवेदना एकसमयावच्छेदेंकरून किंवा एकामागून एक अशा आपल्या मनावर येतात. तसेच त्या बाहेरून, दुरून, जवळून, मागून, पुढून, खालून, वरून, उजवीकडून, डावीकडून येतात. आतां एकसमयावच्छेदकता व आनुपूर्व्य यांमध्ये काळाची कल्पना अन्तर्भूत झालेली आहे व बाह्यता यामध्ये अवकाश, दिशा या कल्पनेचा अन्तर्भाव झालेला आहे. म्हणजे दिक् व काल या संवेदना नव्हत, तर संवेदना मानवी मनाला मिळण्याच्या या अटी आहेत. जर मानवी मनाला संवेदना व्हायच्या असतील तर त्या अवकाश व काल याशिवाय होणार नाहीत. अवकाश व काल ही जणूं कांही मानवी मनाने उत्पन्न केलेली वस्तूंची आवरणे होत. बाह्य वस्तूचे ज्ञान या आवरणांतूनच आपल्याला व्हावे अशीच आपल्या मनाची घटना आहे. म्हणजे अवकाश व काल या संवेदना नव्हत. कारण संवेदना भासण्यास त्यांची जरूरी आहे व त्या बाह्य वस्तुही नव्हत. कारण त्या सर्वव्यापी आहेत तेव्हां अवकाश व काल ही मानवी बुद्धीचा मानवी ज्ञानाला लागणारा वाटा आहे. आतां गणितशास्त्र, अवकाश काल व (पुढे विवेचन करावयाची कल्पना संख्या व परिमाण) संख्या या गुणत्रयीचे शास्त्र आहे हे सर्वसंमत आहे. या शास्त्रांत नवी नवी सत्ये व सिद्धांत आपण सिद्ध करतो तें अनुभवाने किंवा प्रयोगाने करीत नाही तर तें विवेकाने एका खोलीत बसून सिद्ध करतो; तरी पण हे आपल्या विवेकाने सिद्ध केलेले सिद्धांत सर्व ज्ञात-अज्ञात बाह्य सृष्टीतील पदार्थांना लागू असले पाहिजेत, असे आपण खात्रीने सांगू शकतो. सारांश, गणितशास्त्र शक्य आहे. कारण जरी ते केवळ विवेकाने सिद्ध केले जाते,<noinclude>{{center|१०३}}</noinclude>
p3lti2ahxmce971z88fvhg0qul313zh
सदस्य चर्चा:Smrane
3
110379
230299
2026-05-22T11:49:44Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
230299
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Smrane}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १७:१९, २२ मे २०२६ (IST)
1mcshsalztzyruzqfbt2j3astst0wlf