विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.4
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
साहित्यिक:गोविंद चिमणाजी भाटे
102
1266
230434
146594
2026-05-27T06:13:26Z
कल्पनाशक्ती
3813
230434
wikitext
text/x-wiki
{{साहित्यिक
| नाव = गोविंद चिमणाजी
| आडनाव = भाटे
| आडनावाचे अक्षर = भ
| जन्मवर्ष = ११ सप्टेंबर १८७०
| मृत्यूवर्ष = १९४६
| वर्णन =
| चित्र =
| विकिपीडिया =
| विकिकोट्स =
| कॉमन्स =
| कॉमन्स वर्ग =

==साहित्य==
* [[मृत्यूनंतर गुरुची प्रस्तावना|प्रेमसंन्यास - प्रस्तावना - दुसरी आवृत्ती]]
* [[अर्थशास्त्राची मूलतत्वे]]
* [[तीन तत्त्वज्ञानी]]
==मृत्यूवर्ष संदर्भ==
* [https://books.google.co.in/books?id=HbdDDgAAQBAJ&pg=PT130&lpg=PT130&dq=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80+%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87&source=bl&ots=UBTpxiLqAB&sig=b2NITGeyKYx7wj8Q-sPO2mOsnmk&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjupJCWutbVAhXCOY8KHZJNC7kQ6AEIMzAD#v=onepage&q=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%20%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87&f=false मृत्यूवर्ष संदर्भ]
[[वर्ग:प्राचीन साहित्यिक]]
[[वर्ग:गोविंद चिमणाजी भाटे]]
oqkgww80l3jbxdp5ey0f1fvwjvw39o9
अनुक्रमणिका:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf
106
85681
230457
230413
2026-05-27T10:12:55Z
कल्पनाशक्ती
3813
230457
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=माधव रामचंद्र जोशी
|Address=पुणे
|Year=1920
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist 5="अनुक्रमणिका" 6="फोटो" 7="फोटो" 8="नैनिताल" 24="फोटो" 25="फोटो" 29="ग्वालेर" 42="फोटो" 43="फोटो" 48="हरिद्वार किंवा गंगाद्वार" 65 ="गुरुकुल"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

kwbps8qjaffuw7a9r2gxdp9867y0mhd
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०१
104
110352
230423
230291
2026-05-26T12:17:09Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230423
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''कँट'''}}</noinclude>असेल तर ते अनुभव व संवेदना यांनी दिलेले आधिभौतिक शास्त्रांतील ज्ञान होय अशी त्याची दृढ श्रद्धा होती. अशा मनःस्थितीत असतां इंग्रजी तत्ववेता ह्यूम याचे संशयवादी ग्रंथ कँटचे हाती पडले, ह्यूमनें आपल्या ग्रंथांत अनुभव व संवेदन या ज्ञानाच्या आधाराचे दोष दाखवून मानवी प्राण्याला कोणतेंहि ज्ञान शक्य नाही व म्हणून संशयवाद शेवटी शिल्लक राहतो असें प्रस्थापित केले होते. हे ग्रंथ वाचून 'आपण श्रद्धेच्या झोपेतून जागे झालो' असे कँटने म्हटले आहे. मानवी प्राण्याला ज्ञान मिळविणे शक्य आहे व गणितशास्त्र व आधिभौतिक शास्त्रे यांमध्ये सत्य ज्ञान आहे अशी कँटची मनोदेवता त्याला सांगत होती. ह्यूमचे म्हणणे खरें धरले तर सर्व ज्ञान टाकाऊ ठरते. तेव्हा हे गौडबंगाल काय आहे; तत्त्वज्ञान्यांची कोठे तरी मोठी घोडचूक होत असावी; तेव्हां ती घोडचूक शोधून काढणे- गणित व आधिभौतिक शास्त्रांच्या समर्थनार्थ तरी-आवश्यक असे कँटला वाटून त्याने तत्त्वज्ञानाचा प्रश्न हाती घेऊन त्याचा आरंभापासून तलास लावण्याचा विडा उचलला व त्याचेच फल म्हणजे कँटचे परीक्षणात्मक तत्त्वज्ञान होय. म्हणूनच कँटचे तत्त्वज्ञान समजण्यास युरोपच्या अर्वाचीन काळच्या तत्त्वज्ञानाच्या इतिहासाची थोडीशी तरी माहिती असणे अवश्य आहे. तरी या तत्त्वज्ञानाचे येथें किंचित् सिंहावलोकन करूं.
{{gap}}युरोपांतल्या अर्वाचीन युगाला, विद्येच्या पुनरुज्जीवनापासून सुरवात झाली. त्या पूर्वीच्या काळाला मध्ययुग किंवा अज्ञानयुग म्हणतात. या विद्येच्या पुनरुज्जीवनाच्या योगें युरोपांत सर्व शास्त्रांची झपाट्याने प्रगति होऊ लागली, त्याप्रमाणे तत्त्वज्ञानाचाही उद्भव झाला. मनुष्याला ज्ञान मिळणे शक्य आहे काय? हाच तत्त्वज्ञानाचा मुख्य प्रश्न पुढे आला. कारण मध्ययुगीन कल्पनेप्रमाणे बायबल व मान्य केलेले इतर ग्रंथ यांपलीकडे ज्ञानच नाही; मानवी बुद्धीचे काम म्हणजे या ग्रंथांचे विवेचन करणे इतकेच आहे; मानवी बुद्धीला नवीन ज्ञान होणे शक्य नाही, अशी मध्ययुगीन लोकांची समजूत होती. विद्येच्या पुनरुज्जीवनाने या समजुतीला जबरदस्त धक्का बसला व म्हणूनच मानवी ज्ञानाचा प्रश्न<noinclude>{{center|९५}}</noinclude>
kfupv7zaae37di65ez8j80ggb4xbpsi
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०२
104
110353
230424
230292
2026-05-26T12:19:38Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230424
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>महत्त्वाचा बनला. या मानवी ज्ञानाची मीमांसा बेकन व डेकार्ट या दोन तत्त्वज्ञान्यांनी निरनिराळ्या तऱ्हेने केली.
{{gap}}बेकन संवेदनावादाचा जनक बनला. त्याचे मते मनुष्याचे सर्व ज्ञान त्याला इंद्रियद्वारा होतें, बाह्य पदार्थाचे प्रतिबिंब आपल्या इंद्रियांवर पडते. इंद्रिये मनावर संवेदना उत्पन्न करतात व या संवेदनांनी सत्य ज्ञान होते. मानवी मन हे आरशासारखे आहे. आरसा ज्याप्रमाणे स्वच्छ व मलरहित असला म्हणजे त्यावर पदार्थाचें प्रतिबिंब यथार्थ उठते, त्याचप्रमाणे मनामध्ये पूर्वग्रह- कल्पनाशक्तीने किंवा केवल विवेकाने उभारलेले विचार- नसले म्हणजे संवेदनांचा ठसा मनावर यथार्थ उमटतो. तरी सृष्टिज्ञानाला शुद्ध व निर्विचार मन पाहिजे. मानवी कल्पना शक्तीने व विवेकशक्तीने उत्पन्न केलेले विचार हे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आहेत, असे बेकनने म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे कोळी आपल्याच अंगापासून चीक काढून त्याच्या धाग्याचे सुंदर जाळे बनवितो, पण ते एका फुंकरासरसें तुटून जाते, त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीने व केवळ विवेकशक्तीने उभारलेले विचारांचे डोलारे अनुभवाने मोडले जातात, सारांश, बेकनच्या मते मानवी मनाची संवेदनशक्ति हीच खरें ज्ञान देणारी शक्ति होय. कल्पनाशक्ति व विवेकशक्ति या ज्ञानाभास देणाऱ्या शक्ति होत. तरी मनुष्यांनी पहिल्या शक्तीवर विसंबले पाहिजे; तर मनुष्याला सत्यज्ञान होईल. या मताच्या योगे बेकन हा संवेदनावादाचा जनक बनला.
{{gap}}डेकार्ट या फ्रेंच तत्त्वज्ञान्याने दुसराच पंथ काढला, मला कोणत्या गोष्टीचे खात्रीचे ज्ञान आहे? या प्रश्नापासून त्याने तत्त्वज्ञानाला सुरवात केली. त्याचे मते आपली इंद्रिये आपल्याला फसवितात; कारण ती पुष्कळ वेळां ज्ञानाचा आभास मनांत उत्पन्न करतात. आपल्याला दृष्टिभ्रम होतो, श्रुतिभ्रम होतो. तेव्हां बाह्य सृष्टीचे खरे ज्ञान आपल्याला होत नाही. तसेंच गणितशास्त्रांतील प्रमेयें तरी खरी कशावरून असा आपल्याला संशय येतो. सारांश; ज्ञानासंबंधी आपण विचार करू लागलों म्हणजे 'मला सर्व गोष्टींबद्दल संदेह वाटतो' अशा विधानाला आपण येऊन पोचतो.{{nop}}<noinclude>{{center|९६}}</noinclude>
5j6hbwrar12jztti8i4x03w10qtqwz6
230426
230424
2026-05-26T12:22:42Z
सुबोध कुलकर्णी
1231
230426
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />'''तत्त्वज्ञानी.'''</noinclude>महत्त्वाचा बनला. या मानवी ज्ञानाची मीमांसा बेकन व डेकार्ट या दोन तत्त्वज्ञान्यांनी निरनिराळ्या तऱ्हेने केली.
{{gap}}बेकन संवेदनावादाचा जनक बनला. त्याचे मते मनुष्याचे सर्व ज्ञान त्याला इंद्रियद्वारा होतें, बाह्य पदार्थाचे प्रतिबिंब आपल्या इंद्रियांवर पडते. इंद्रिये मनावर संवेदना उत्पन्न करतात व या संवेदनांनी सत्य ज्ञान होते. मानवी मन हे आरशासारखे आहे. आरसा ज्याप्रमाणे स्वच्छ व मलरहित असला म्हणजे त्यावर पदार्थाचें प्रतिबिंब यथार्थ उठते, त्याचप्रमाणे मनामध्ये पूर्वग्रह- कल्पनाशक्तीने किंवा केवल विवेकाने उभारलेले विचार- नसले म्हणजे संवेदनांचा ठसा मनावर यथार्थ उमटतो. तरी सृष्टिज्ञानाला शुद्ध व निर्विचार मन पाहिजे. मानवी कल्पना शक्तीने व विवेकशक्तीने उत्पन्न केलेले विचार हे कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे आहेत, असे बेकनने म्हटलेले आहे. ज्याप्रमाणे कोळी आपल्याच अंगापासून चीक काढून त्याच्या धाग्याचे सुंदर जाळे बनवितो, पण ते एका फुंकरासरसें तुटून जाते, त्याचप्रमाणे कल्पनाशक्तीने व केवळ विवेकशक्तीने उभारलेले विचारांचे डोलारे अनुभवाने मोडले जातात, सारांश, बेकनच्या मते मानवी मनाची संवेदनशक्ति हीच खरें ज्ञान देणारी शक्ति होय. कल्पनाशक्ति व विवेकशक्ति या ज्ञानाभास देणाऱ्या शक्ति होत. तरी मनुष्यांनी पहिल्या शक्तीवर विसंबले पाहिजे; तर मनुष्याला सत्यज्ञान होईल. या मताच्या योगे बेकन हा संवेदनावादाचा जनक बनला.
{{gap}}डेकार्ट या फ्रेंच तत्त्वज्ञान्याने दुसराच पंथ काढला, मला कोणत्या गोष्टीचे खात्रीचे ज्ञान आहे? या प्रश्नापासून त्याने तत्त्वज्ञानाला सुरवात केली. त्याचे मते आपली इंद्रिये आपल्याला फसवितात; कारण ती पुष्कळ वेळां ज्ञानाचा आभास मनांत उत्पन्न करतात. आपल्याला दृष्टिभ्रम होतो, श्रुतिभ्रम होतो. तेव्हां बाह्य सृष्टीचे खरे ज्ञान आपल्याला होत नाही. तसेंच गणितशास्त्रांतील प्रमेयें तरी खरी कशावरून असा आपल्याला संशय येतो. सारांश; ज्ञानासंबंधी आपण विचार करू लागलों म्हणजे 'मला सर्व गोष्टींबद्दल संदेह वाटतो' अशा विधानाला आपण येऊन पोचतो.{{nop}}<noinclude>{{center|९६}}</noinclude>
f1ywmpv58wey5is4bas8e2eja8j9kxt
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०३
104
110354
230425
230293
2026-05-26T12:21:46Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230425
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''कँट'''}}</noinclude>पण या संदेहात्मक विधानांत एका पदार्थाबद्दल संदेह राहत नाही. तो पदार्थ म्हणजे अहंभावरूप आत्मा अगर मन. संदेह वाटण्याला सुद्धा 'संदेही' अस्तित्वांत पाहिजे. तेव्हां 'मी विचार करतो म्हणून मी अस्तित्वांत आहे' हे मोठे प्रमेय या संदेहपद्धतींतून निघते. अहंभावाची जाणीव असलेल्या आत्म्याच्या अस्त्विाबद्दलचे पहिले सत्य आपल्याला निश्चितपणे कळतें. आतां या सत्यापासून आणखी सत्ये निष्पन्न होतात. आत्म्याच्या संदेहवृत्तीपासून आत्म्याचे अस्तित्व सिद्ध होते. पण संदेहवृत्ति- आत्मा म्हणजे अपूर्ण सदोष आत्मा होय. पण अपूर्ण व सदोष आत्मा ही कल्पना सापेक्ष आहे. ती कळण्याकरता 'संपूर्ण व दोषरहित आत्मा' ही कल्पना कळावीच लागते. पण ही दुसरी कल्पना म्हणजेच सर्वगुणसंपन्न परमेश्वराची कल्पना होय. तेव्हां जीवात्मा व परमात्मा अशा दोन कल्पना आपल्याला कळल्या. त्यांपैकी जीवात्म्याच्या अस्तित्वाची खात्री झालीच आहे. आतां परमात्म्याच्या अस्तित्वाची खात्री खालील प्रमाणाने पटते. सर्वगुणसंपन्न परमात्मा अस्तित्वात असलाच पाहिजे. कारण जर तो अस्तित्वांत नसेल तर तो सर्वगुणसंपन्न होणार नाही. कारण अस्तित्व हा गुण त्याच्यामध्ये नाही असे होईल. या विचारसरणीने सृष्टीतील दोन पदार्थ सिद्ध झाले. आतां राहिली बाह्य सृष्टि. हिचे अस्तित्वही सिद्ध करता येते. परमात्मा सर्वगुणसंपन्न आहे. या गुणांमध्ये 'सचोटी' हा गुण येतो. तेव्हां सर्वगुणसंपन्न परमेश्वर दुसऱ्यास फसविणार नाही. म्हणूनच आपल्या इंद्रियांना ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या त्या सत्यमय असल्या पाहिजेत. नाही तर परमेश्वराने आपल्याला भ्रमविणारी इंद्रिये देऊन फसविले असे होईल. याप्रमाणे तत्त्वज्ञानाचे तीन पदार्थ सिद्ध झाले. जीवात्मा, परमात्मा व जड सृष्टि परमात्मा हा पूर्ण असून त्यानेच जीवात्मे व जड सृष्टि निर्माण केली. जीवात्मे व जड सृष्टि यांचे गुण परस्परविरोधी आहेत. जीवात्मा विवेकवान् व अवकाशरहित पदार्थ आहे तर जड सृष्टि ही विवेकरहित व अवकाश व्यापणारी आहे. याप्रमाणे डेकार्टचे तत्त्वज्ञान आहे. या तत्त्व-<noinclude>{{center|९७}}

{{gap}}सा...७</noinclude>
67w1wtbb9bishldtb708ddcv4zoj58s
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०४
104
110355
230427
230294
2026-05-26T12:24:09Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230427
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्त्वज्ञानी.'''</noinclude>ज्ञानाचा विशेष म्हणजे त्यांत मानवी मनाच्या विवेकावर सर्व भर टाकलेला आहे. म्हणूनच डेकार्ट हा विवेकवादाचा जनक बनला.
{{gap}}डेकार्टचे तत्त्वज्ञान स्पायनोझा याने परिपूर्णतेस आणिलें. साधारणतः यासारख्याच मतांचा पुरस्कार लायबनिट्स या जर्मन तत्त्वज्ञान्याने केला व लायबनिटझच्या मतांचा व्यवस्थित संग्रह वुल्फ या तत्त्वज्ञान्याने केला व हेच तत्त्वज्ञान कँटच्या काळी जर्मन युनिव्हर्सिटींत प्रचलित होते. हे मागे एकदां सांगितलेच आहे.
{{gap}}बेकनने प्रारंभ केलेल्या संवेदनावादाकडे आता वळणे जरूर आहे. बेकन हा तत्त्वज्ञानी म्हणून फारसा प्रसिद्ध नाही. संवेदनावादाचा खरा पुरस्कर्ता लॉक हा इंग्रज तत्त्वज्ञानी होय. त्याने सर्व ज्ञान संवेदनांनी मिळते असे प्रतिपादन केले. विवेकशक्तीचाही त्याने उल्लेख केला आहे. पण ज्ञानाच्या बाबतीत विवेकाचे काम गौण आहे असे त्याचे म्हणणे आहे. सर्व ज्ञानाचें मूळ संवेदनांत आहे. संवेदनांनी काही ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाच्या संयोगाने आणखी ज्ञान विवेकाला काढता येईल. पण सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे असे लॉकचे म्हणणे आहे. त्याचे मतें प्रारंभी मानवी मन कोऱ्या कागदासारखे असते. त्यावर संवेदनांनीच प्रथमतः संस्कार होतात व त्यांपासून मग पुढे विचार बनतात. डेकार्टप्रमाणे लॉकही सृष्टीत तीन पदार्थ आहेत असे मानीत असे. इंद्रियांनी दिलेल्या संवेदनांनी आपल्याला बाह्य सृष्टि कळते. म्हणजे बाह्य सृष्टीचे सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे. आत्म्याचे ज्ञान आपल्या सर्व जाणीवेत व संवेदनांत प्रतीत होते असे डेकार्टप्रमाणेच लॉक म्हणे. ईश्वराचे ज्ञान आपल्याला अनुमानाने होते असे तो म्हणे; ते येणेप्रमाणे:--
{{gap}}ही सृष्टि व मानवी प्राणी ही कार्ये होत. आतां या कार्यांना कोणी तरी कर्ता पाहिजे व तो कर्ता सर्वशक्तिमान व सर्वज्ञ असा असला पाहिजे. तो अर्थात् परमेश्वरच होय. लॉकच्या पुढची संवेदनवादाची पायरी बार्क्लेनें गांठली. त्याने तर सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे व म्हणून बाह्य जगच मुळीं मानतां येत नाही असे दाखविले. पण या पुस्तकांत<noinclude>{{center|९८}}</noinclude>
qx0gejwm5t944zw4hp8vllj0zcagqu4
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०५
104
110356
230428
230295
2026-05-26T12:26:59Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230428
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''कँट'''}}</noinclude>बार्क्लेंच्या तत्वज्ञानाची हकीकत आलीच आहे. तेव्हां त्याची येथे पुनरावृत्ति करण्याचे कारण नाही.
{{gap}}ह्यूमने संवेदनावादाचा अंत संशयवादांत कसा होतो हे स्पष्ट करून दाखविले. त्याने प्रथमतः तीन पदार्थाबद्दल संशय प्रदर्शित केला. त्याचे म्हणणे हे की, बार्क्लेने दाखविलेल्या ज्या कारणाकरितां आपल्याला जड सृष्टीचे अस्तित्व मानतां येत नाही त्याच कारणाकरितां आत्मा व परमात्मा यांचेही अस्तित्व मानतां येत नाही. कारण संवेदनांच्या मागे काही तरी 'जड पदार्थ' आहे असे आपल्याला सांगता येत नाही, तर मनाच्या संवेदना, कल्पना, विचार, वासना व विकार- मनाचे सर्व व्यापार यांच्या मागें आत्मा आहे असें तरी कसे सांगतां येईल? व जड सृष्टि व आत्मा हे पदार्थ संशयास्पद ठरल्यावर परमात्मा या पदार्थाच्या अस्तित्वाला तरी आधार काय? तोही संशयास्पद ठरतो.
{{gap}}याप्रमाणे ह्यूमने तत्त्वज्ञानाच्या पदार्थत्रयावर घाला घातला. पण तो येथेच थांबला नाही. आधिभौतिक शास्त्राचा पाया जी 'कार्यकारणाची कल्पना' त्या कल्पनेवर ह्यूमने घाव घालण्यास सुरवात केली. बेकन, लॉक किंवा बार्क्ले या संवेदनावादी तत्त्वज्ञान्यांनी कार्यकारणभावाची कल्पना गृहीतच धरली होती. लॉकच्या मते ती कल्पना आपल्या इतर शास्त्रीय कल्पनांप्रमाणे आपल्याला अनुभवाने-संवेदनांनी कळते. येथेच ह्यूमने लॉकची घोडचूक दाखविली. ह्यूमचे म्हणणे असे की, कार्यकारण भावाचा विचार ही कल्पनाशक्तीची भ्रांति आहे. ती संवेदनांनी समजणे शक्यच नाही. कारण, संवेदना एकामागून येतात, एवढेच संवेदना सांगू शकते; एक बिलियर्ड गोटी हालल्यानंतर दुसरी हलते, उष्णतेची संवेदना झाल्यावर भाजल्याची संवेदना होते. पण एक गोटी दुसऱ्या गोटीच्या गतीचे कारण हे काही आपण पहात नाही. तसेच उष्णता हे भाजल्याचे कारण हे कांही आपण पहात नाही. उष्णता व भाजणे ही पुष्कळ वेळां एका मागून एक आली म्हणजे आपल्याला त्यामध्ये जास्त निकट संबंध आहे असा नुसता भास होतो; परंतु संवेदनांमध्ये निकट<noinclude>{{center|९९}}</noinclude>
af8qzt4ys0mszxbbf1gewc9dqvdtcyf
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०६
104
110357
230429
230296
2026-05-26T12:28:41Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230429
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्त्वज्ञानी.'''</noinclude>संबंध उत्पन्न होत नाही; तर जो कल्पनासंगतीच्या तत्वानुरूप आपल्या केवळ मनांत उत्पन्न होतो. तेव्हां आपल्याला संवेदनांनी जे बाह्य सृष्टीचे ज्ञान होते ते अगदी विस्कळीत असते. त्यांत संबंधकल्पना येत नाही. म्हणून कार्यकारणाची भावना हा निवळ मानवी कल्पनेचा भ्रम आहे. त्यांत सत्यांश मुळीच नाही. याप्रमाणे ह्यूमने कार्यकारण भावाच्या कल्पनेवर घाला घातला व ती कल्पना भ्रममूलक आहे असे दाखविले. या योगें कार्यकारण भावाच्या तत्वावर उभारलेली सर्व आधिभौतिक शास्त्रांची इमारत पार ढासळली. ह्यूमच्या मताप्रमाणे पदार्थत्रय संशयास्पद झाले; कार्यकारणभाव भ्रमरूप झाला. अर्थात् शास्त्राचा सर्व पायाच गेला व अशा तऱ्हेनें ह्यूमने संवेदनावादाचा संशयवादांत शेवट करून दाखविला.
{{gap}}मानवी मनाला ज्ञान असाध्य आहे व म्हणूनच संशयवाद खरा ही कल्पना कँटच्या मनाला मुळीच सहन होईना. तरुण वयापासून त्याचा सर्व भर आधिभौतिक शास्त्रांवर, ती शास्त्रेही ह्युमच्या तत्वज्ञानाने जेव्हां विलयास जाऊ लागली, तेव्हां कँटचे मन गोंधळून गेले. त्याची मनोदेवता त्याला सांगे की गणित व भौतिक शास्त्र या द्वयीमध्ये तरी सत्य ज्ञान आहे खास. पण तत्वज्ञानाच्या पंथाप्रमाणे तर या ज्ञानावर पाणी सोडण्याची पाळी आली. तरी पूर्वीच्या तत्वज्ञानाची कोठे तरी भयंकर भूल होत असली पाहिजे असे कँटच्या मनाने घेतले. व म्हणूनच त्याने तत्वज्ञानाचा प्रश्न मूळापासून स्वतंत्रपणे सोडविण्याचा निश्चय केला व त्या निश्चयाचे फळ म्हणजेच कँटचे परिक्षणात्मक तत्वज्ञान होय. तेव्हां आतां त्या कँटच्या तत्वज्ञानाकडेच आपण वळणे बरे.
{{rule|7em}}{{rule|7em}}{{rule|7em}}{{nop}}<noinclude>{{center|१००}}</noinclude>
3qbijg6hte4xovfl22ag49qgf4m2a5k
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०७
104
110358
230430
230297
2026-05-26T12:30:02Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230430
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>

{{center|{{xx-larger|(३)
'''कँटचे तत्त्वज्ञान.'''}}}}
{{rule|7em}}
{{gap}}पूर्वीच्या सर्व तत्वज्ञानापासून आपल्या तत्त्वज्ञानाचा फरक दाखविण्याकरतां कँटने आपल्या तत्वज्ञानाला 'परीक्षणात्मक तत्वज्ञान' असें नवीन नांव दिले आहे व ते त्याने तीन ग्रंथांत ग्रथित केले आहे. या ग्रंथांची नांवेंही दुर्बोध अशी आहेत. प्रथमतः त्याने 'शुद्ध विवेकाचे परीक्षण' या नांवाचा ग्रंथ लिहिला. हाच त्याच्या तत्वज्ञानाचा मूळ ग्रंथ होय. यामध्ये कँटने आपली नवी ज्ञानमीमांसा इचे विवेचन केले. नंतर त्याने 'सदसद्विवेकाचे परीक्षण' म्हणून दुसरा ग्रंथ लिहिला. यांत त्याचे नीतिशास्त्रविषयक विचार आलेले आहेत. शेवटी त्याने 'भावनेचे परीक्षण' नांवाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ कँटच्या तत्वज्ञानरूपी कमानीचा जणू कांही मधला चिराच आहे. यामध्ये आपल्या पहिल्या दोन ग्रंथांतील विचारांचा मेळ घालून कँटने त्यावर नवीन विचारांचा मुगुटमणी चढविला आहे. हे तीन ग्रंथ म्हणजे मानवी मनाच्या तीन प्रमुख शक्ति- विवेकशक्ति, इच्छाशक्ति व भावनाशक्ती- यांचे विवेचन आहे असे म्हटले तरी चालेल. आतां क्रमाने या तीन ग्रंथांचे थोडक्यांत सार सांगू या.
{{gap}}कँटने कॉलेजांत असतांनाच वुल्फच्या विवेकवादी तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. या मताचे म्हणणे हे की, सर्व मानवी ज्ञान विवेकानें होते. पण त्याच वेळी विवेकशक्तीचा कमतरपणा कँटच्या मनांत आला होता. विवेकशक्ति ही पृथक्करणात्मक शक्ति आहे; ती विधायक शक्ति नाहीं. विवेक विचारांचे पृथक्करण करून त्यांतून अनुमानाने सिद्धांत काढील. परंतु विवेकानें नवीन ज्ञान कधीही होणार नाही. विवेकाला प्रथमतः पुष्कळसे सिद्धांत गृहीत धरावे लागतात व त्या सिद्धांतांच्या साहाय्याने<noinclude>{{center|१०१}}</noinclude>
qmlg5zj56w96bcu39bikhoaqdknttk0
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०८
104
110359
230431
230298
2026-05-26T12:30:50Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230431
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्त्वज्ञानी.'''</noinclude>उपसिद्धांत विवेक काढतो. तेव्हां सर्व ज्ञान विवेकानें होते हे म्हणणे बरोबर नाही असें कँटला वाटत असे. त्या वेळी हे गृहीत धरलेले सिद्धांत अनुभवाने कळतात असें त्याला वाटे, पण ह्यूमनें अनुभवाने सिद्धांत निघत नाहीत असे दाखविण्याचा प्रयत्न केला. याप्रमाणे सर्व ज्ञान संशयास्पद होऊ लागले. म्हणूनच कँटनें मानवी ज्ञान कसें होतें हाच प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाचे त्याने चार विभाग केले व आपल्या ग्रंथांच्या चार भागांत त्यांचे विवेचन केले. मानवी ज्ञानाचे स्थूल मानाने तीन शास्त्रांमध्ये वर्गीकरण करता येते. गणित, आधिभौतिक शास्त्रे किंवा सृष्टिशास्त्र आणि तत्वज्ञान, गणित व सृष्टिशास्त्रे ही अस्तित्वांत असून त्यांची सारखी प्रगति होत आहे ही निर्विवाद गोष्ट आहे असें कँटचे म्हणणे होते. तत्वज्ञानाच्या अस्तित्वाबद्दल मात्र शंका आहे. कारण त्यांत सर्वसंमत अशी प्रमेयेंच दृष्टीस पडत नाहीत. म्हणून विचार करावयाचे प्रश्न हे होत.
{{gap}}१ गणितशास्त्र का व कसे शक्य आहे?
{{gap}}२ सृष्टि शास्त्र का व कसे शक्य आहे?
{{gap}}३ तत्त्वज्ञान शक्य आहे का? व शक्य नसल्यास मानवी मनाची तत्त्वज्ञानविषयक स्वाभाविक प्रवृत्ति का आहे?
{{gap}}४ कोणत्या पायावर नवीन तत्वज्ञान बनविता येईल.?
{{gap}}कँटच्या पहिल्या परीक्षणात्मक ग्रंथांत या चार प्रश्नांची चार भागांत उत्तरें आलेली आहेत. ही उत्तरे देतांना कँटच्या मनापुढे विवेकवाद व संवेदनावाद हे एकांगीवाद सारखे आहेत व त्यांना उद्देशूनच जणू काही कँटने या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्याचा प्रथमतः ओढा संवेदनावादाकडे होता व म्हणून त्या वादाच्या म्हणण्यापासून सुरवात करून कँटनें त्या वादाचा कमतरपणा दाखवून हळुहळू आपल्या परीक्षणात्मक तत्वज्ञानाकडे वाचकांना ओढीत नेलें आहे.
{{gap}}सर्व मानवी ज्ञानाला संवेदनांपासून सुरवात होते हे खरे आहे. पण त्यावरून सर्व ज्ञान संवेदनात्मक आहे हे मात्र खरे नाही. संवेदना ही<noinclude>{{center|१०२}}</noinclude>
7qfwjkzvfi59eqtlqyqksj9y6vard93
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१०९
104
110360
230432
230300
2026-05-27T05:44:34Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230432
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''कँट'''}}</noinclude>ज्ञानाचे एक अंग आहे. त्या अंगाला बुद्धीच्या व्यापाराची जोड झाल्याखेरीज त्याला ज्ञानरूप प्राप्त होत नाही. तेव्हां बुद्धीचे अंग ज्ञानाला आवश्यक आहे व ज्ञान हे संवेदना व विचार (बुद्धीचे कार्य) यांच्या संयोगापासून होते असे कँटने प्रतिपादन केले आहे व प्रथमतः संवेदनांत बुद्धीचा अंश कसा आहे हे पहिल्या भागांत दाखवून दिले आहे.
{{gap}}बाह्य पदार्थांपासून इंद्रियद्वारा आपल्याला संवेदना होतात असे आपण म्हणतो. या संवेदना एकसमयावच्छेदेंकरून किंवा एकामागून एक अशा आपल्या मनावर येतात. तसेच त्या बाहेरून, दुरून, जवळून, मागून, पुढून, खालून, वरून, उजवीकडून, डावीकडून येतात. आतां एकसमयावच्छेदकता व आनुपूर्व्य यांमध्ये काळाची कल्पना अन्तर्भूत झालेली आहे व बाह्यता यामध्ये अवकाश, दिशा या कल्पनेचा अन्तर्भाव झालेला आहे. म्हणजे दिक् व काल या संवेदना नव्हेत, तर संवेदना मानवी मनाला मिळण्याच्या या अटी आहेत. जर मानवी मनाला संवेदना व्हायच्या असतील तर त्या अवकाश व काल याशिवाय होणार नाहीत. अवकाश व काल ही जणूं कांही मानवी मनाने उत्पन्न केलेली वस्तूंची आवरणे होत. बाह्य वस्तूचे ज्ञान या आवरणांतूनच आपल्याला व्हावे अशीच आपल्या मनाची घटना आहे. म्हणजे अवकाश व काल या संवेदना नव्हेत. कारण संवेदना भासण्यास त्यांची जरूरी आहे व त्या बाह्य वस्तुही नव्हेत. कारण त्या सर्वव्यापी आहेत तेव्हां अवकाश व काल ही मानवी बुद्धीचा मानवी ज्ञानाला लागणारा वाटा आहे. आतां गणितशास्त्र, अवकाश काल व (पुढे विवेचन करावयाची कल्पना संख्या व परिमाण) संख्या या गुणत्रयीचे शास्त्र आहे हे सर्वसंमत आहे. या शास्त्रांत नवी नवी सत्ये व सिद्धांत आपण सिद्ध करतो तें अनुभवाने किंवा प्रयोगाने करीत नाही तर तें विवेकाने एका खोलीत बसून सिद्ध करतो; तरी पण हे आपल्या विवेकाने सिद्ध केलेले सिद्धांत सर्व ज्ञात-अज्ञात बाह्य सृष्टीतील पदार्थांना लागू असले पाहिजेत, असे आपण खात्रीने सांगू शकतो. सारांश, गणितशास्त्र शक्य आहे. कारण जरी ते केवळ विवेकाने सिद्ध केले जाते,<noinclude>{{center|१०३}}</noinclude>
k9cga0ncp1ge481ikk8p9k20aq75hg6
पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११०
104
110361
230433
230301
2026-05-27T05:47:00Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* प्रमाणित */
230433
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />'''तीन तत्वज्ञानी.'''</noinclude>तरी गणितशास्त्राचे विषय मुळी मानवी मनाने संवेदनांस दिलेले असल्यामुळे गणिताचे सिद्धांत सर्व पदार्थमात्राला लागू आहेत.
{{gap}}याच्या पुढल्या प्रश्नाच्या उत्तराकरितां कँटने ज्ञानाचे जास्त पृथक्करण केले आहे. आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्या विस्कळीत कल्पना नव्हेत. ज्ञान हे दोन कल्पनांच्या संयोगाने होते, म्हणजे ज्ञान हे विधानाच्या योगें होतें. आतां ह्यूमने म्हटल्याप्रमाणे संवेदना तर विस्कळीत व एकापासून एक दूर अशा असतात, त्यांत संबंध दिसून येत नाही. सर्व ज्ञान तर संबंधमय असते. तेव्हां ज्ञानांत हे संबंध कसे उत्पन्न होतात? तर बुद्धि आपल्या काही स्वयंसिद्ध कल्पनांनी हे संबंध उत्पन्न करते व ज्या अर्थी विधाने बुद्धीने केली जातात त्या अर्थी तर्कशास्त्राने केलेल्या विधानांच्या वर्गीकरणाकडे पाहिले म्हणजे ज्ञानामध्ये बुद्धीचा अंश किती हे तेव्हांच कळून येईल. कँटनें विधानाच्या वर्गीकरणावरून व पृथक्करणावरून खालील कल्पना ज्ञानामध्ये अन्तर्भूत होतात असे काढले आहे.

| संख्येची कल्पना || १ एकत्व, बहुत्व व एकूणत्व

| गुणाची कल्पना || १ अस्तित्व, नास्तित्व व आस्तित्वनास्तित्व

| संबंधाची कल्पना || १ पदार्थांची शाश्वतता, २ कार्यकारणभाव ३ अन्योन्याश्रयभाव.

| संभवनीयतेची कल्पना || २ शक्यता व अशक्यता, २ प्रत्यक्षता, अप्रत्यक्षता ३ अवश्यकता व संभवनीयता

{{gap}}विस्कळीत संवेदनांना ज्ञानात्मक स्वरूप येण्यास या सर्व कल्पना अवश्यक आहेत. व या विशिष्ट कल्पनांशिवाय आणखी सर्व ज्ञानांत एक सामान्य कल्पना अन्तर्भूत झालेली असते; ती कल्पना म्हणजे ज्ञात्याची होय. सर्व संवेदनाचे एकीकरण व्हावयास या सर्व कल्पना मी अनुभवीत आहे अशी आत्म्याची जाणीव लागते. त्याखेरीज संबद्ध असें ज्ञानच शक्य नाही. तरी आतां पूर्वीच्या विवेचनाचा संग्रह करून मानवी ज्ञानाचे अवयव कोणते ठरतात ते पाहू या.
{{gap}}ज्ञान होण्यास प्रथमतः संवेदना पाहिजेत हे उघड आहे. संवेदनां-<noinclude>{{center|१०४}}</noinclude>
q9r8ses2daoilhncslbsgw8vvq3ybo3
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५१
104
110436
230437
230422
2026-05-27T06:37:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230437
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>बाजारांतून आपण जाऊं लागलों म्हणजे हे तुंदिलतनु लोक सारखे पाठीस लागतात. एक म्हणतो "बाबूजी हमकू दूध लाव!" दुसरा म्हणतो "बाबूजी हम मलई चाहते हमकू मलई देव!" तिसरा तिसरेंच कांहीं मागतो! सारांश, या लोकांना याचना व भोजन यांखेरीज दुसरा विषयच ठाऊक नाहीं. याप्रमाणे येथले लोक पाहून व त्यांची दिनचर्या व एकंदर वृत्ति आणि वागणूक पाहून मनुष्याला एक प्रकारचा खेदच होतो. काय या लोकांचं जीवित! '''वाणीच याचनकृते ग्रसनाय वक्त्रम्''' अशी यांची वृत्ति व कृति! अशा माणसांबद्दल आदर वाटण्याऐवजी तिरस्कार मात्र उत्पन्न होतो. याप्रमाणे येथल्या वस्तीकडे पाहिलें म्हणजे धर्मप्रवृत्ति जागृत न होतां उलट मावळूनच जाते. तरी या ठिकाणचें सृष्टिसौंदर्य पाहिले म्हणजे मात्र याच्या अगदी उलट परिणाम होतो व या स्थानाचे इतकें माहात्म्य व पावित्र्य सतत कायम कां राहणार हे ध्यानांत येतें. असो.
{{gap}}वर सांगितलेच आहे, कीं, आह्मांला या खेपेला पंड्याच्या साहाय्याची जरूरी नव्हती. म्हणून आह्मीं एक दोन घोड्यांची गाडी करून त्यांत सर्व सामान भरलें व आमच्या ठरलेल्या ठिकाणी जाण्यास निघालों. आम्हाला जरूर नाहीं असें म्हटलें, तरी एक पंड्या आमच्या गाडीच्या बॉक्सवर बसलाच! गांव लहानच असल्यामुळे आमची धर्मशाळा आह्मांला तेव्हांच सांपडली. अर्थात्, आह्मांला पंड्याची मुळींच गरज लागली नाहीं. तरी पण आह्मी हरिद्वाराहून निघण्याचे आधी, आमचेबरोबर आलेल्या पंड्यास एक रुपया दिला! मात्र बळेंच बॉक्सवर बसणाऱ्या पंड्यास कांहीं एक न देतां परत लावलें.
{{gap}}आह्मीं ज्या धर्मशाळेंत उतरण्यास गेलों होतों, ती धर्मशाळा साधारण गावाबाहेर असून चांगली प्रशस्त व स्वच्छ होती; व तेथील व्यवस्थापकही फार चांगला माणूस असल्यामुळे व त्याला थोडे फार इंग्रजी येत असल्यामुळें आह्मांला भाषाव्यवहाराची अडचण भासली नाहीं व आमची सर्व सोय उत्तम झाली. प्रथमतः जेव्हां मी हरिद्वारास आलों होतों तेव्हां जेवणाखाणाचे बरेच हाल झाले. ह्मणून या खेपेला आह्मी बरोबर अलीकडे<noinclude>
{{gap}}४० ]</noinclude>
h3yikgaq491oqwn9hvkfi1btvdqpeb4
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६०
104
110437
230435
2026-05-27T06:18:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230435
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf
|Page = 60
|bSize = 498
|cWidth = 354
|cHeight = 354
|oTop = 125
|oLeft = 68
|Location = center
|Description =

{{center|'''हरिद्वार- हरीची पायरी'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
p58e3ogkpexi2rr74qf763xktfn27rn
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६१
104
110438
230436
2026-05-27T06:19:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230436
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf
|Page = 61
|bSize = 498
|cWidth = 344
|cHeight = 336
|oTop = 119
|oLeft = 66
|Location = center
|Description =

{{center|'''हरिद्वार- कनखल तीर्थ'''}}{{nop}}<noinclude></noinclude>
8u0wrj2gf41906ygasyfz11ypwrxtx5
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५२
104
110439
230438
2026-05-27T06:41:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230438
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''हरिद्वार.'''}}</noinclude>प्रचारांत येऊ घातलेला 'कुकर' घेतला होता. प्रवासांत या 'कुकर'पासून फारच सोय व सुख होतें. कारण त्याला लाकूडफाटे किंवा चूल लागत नाहीं. एक प्रायमस स्टोव्ह बरोबर असला म्हणजे सर्व काम भागतें. या कुकरनें आम्हांला पुराणांतरींच्या द्रौपदीच्या स्थालीचीच आठवण झाली. त्या स्थालीत ज्याप्रमाणें इच्छेप्रमाणे आपोआप अन्न तयार होत असे, तसाच येथेही प्रकार होतो. भाजी, भात वरण हे पदार्थ 'कुकर'- मध्ये घालून 'कुकर' स्टोव्हवर ठेवून खुशाल बाहेर जावें आणि तास दीड तासाने परत यावें, तों स्वयंपाक्याने तयार केल्याप्रमाणे सुंदर अन्न तयार होतें. अशी आमची व्यवस्था असल्यामुळे आमचा हरिद्वार येथील आठवडा फारच सुखानें व आनंदानें गेला; व तो इतक्या जलद गेला, कीं, आमचें हरिद्वारचें राहाणें स्वप्रांतील तर नव्हे, असे आम्हांला केव्हां केव्हां वाटे.
{{gap}}हरिद्वार या पवित्र स्थानाचा विशेष म्हणजे येथील गंगा होय. बाकी, हे गांव काशी, प्रयाग, मथुरा किंवा द्वारका याप्रमाणें मोठें नाहीं. येथली वस्ती अवघी चार हजार आहे. येथे मोठमोठ्या इमारती नाहींत. येथें भव्य देवळें नाहींत, येथें मोठा व्यापार आहे असाही प्रकार नाहीं. प्रत्यक्ष गांव मोठ्याशा खेड्यासारखे आहे. घरेही सामान्यच आहेत. परंतु या गांवची रचना, ठेवण व येथली गंगा हीँ मात्र अप्रतिम आहेत. म्हणूनच या गांवाला फार प्राचीन काळापासून इतकें पावित्र्य आलेले आहे.
{{gap}}हें पवित्रस्थान निरनिराळ्या काळी निरनिराळ्या नांवानें प्रसिद्ध होतें. प्रथमतः शिवभक्त व विष्णुभक्त यांचेमध्यें या गांवाच्या नांवासंबंधानें मोठा वाद आहे. शिवभक्त म्हणतात या गांवाचें नांव हरद्वार. विष्णुभक्त म्हणतात या गांवाचें खरें नांव हरिद्वार. या दोन पंथांच्या लोकांमध्ये मोठमोठ्या मारामाऱ्या या स्थळी होत व त्या अगदीं अव्वल इंग्रजीपर्यंत चालत असत. या गांवाचें फार जुनें नांव कपिलस्थान हे होय व अजूनही कपिलस्थान म्हणून एक जागा दाखविण्यांत येते. कपिल हा एक फार प्रख्यात तपस्वी होता. या कपिल शहरालाच तैमूरलंगानें आपल्या इतिहासांत कुटिल म्हटलें आहे असें म्हणतात. प्रसिद्ध चिनी प्रवासी हुएनसंग हा या ठिकाणी आला होता. त्यानें या गांवाचें नांव मोयुलो असें दिलें आहे.<noinclude>{{right|[ ४१ }}</noinclude>
rk72p5v8zwoeqdoqdc24fq1ix1xtlxm
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५३
104
110440
230439
2026-05-27T06:48:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230439
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>मोयुलो म्हणजे मयापुर किंवा मयूर असावें. मयापुर या नांवाचे फार जुनें ठिकाण हरिद्वारच्या दक्षिणेस फारच जवळ आहे. अकबराच्या कारकीर्दीतील प्रसिद्ध इतिहासकार अबुल फाजल याने या गांवाला मय अथवा हरिद्वार असें म्हटलें आहे. अकबराच्या काळीं येथे तांब्याच्या नाण्यांची एक टांकसाळ होती व अकबर आपल्याला प्यावयाला पाणी नेहेमी या ठिकाणाहून नेत असे, असें म्हणतात. या ठिकाणाला गंगाद्वार असेही नांव आहे व मुसलमान इतिहासकार या स्थळाचा निर्देश गंगाद्वार म्हणूनच करतात; व पुढील वर्णनावरून हेंच नांव अन्वर्थक आहे असें दिसून आल्याखेरीज राहणार नाहीं.
{{gap}}या पवित्र स्थानाचे येवढे पूर्वचरित्र बस्स आहे. आतां आपण त्याच्या सांप्रतच्या स्वरूपाकडे वळू. हरिद्वार हे गांव गंगेच्या दक्षिण तीरावर शिवालिक नांवाच्या हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या टेकड्यांच्या बाजूला बसलेलें आहे व गंगानदी थेट गांवाला व टेकड्यांना लागून गेली आहे. नदीच्या दोन्ही तीरांस टेकड्यांची रांग आहे व मध्ये एक दरी झाली आहे. यामुळे हिमालयाने जणूं काय आपल्या लहान लहान टेकड्यांचें एक दार बनवून त्यांतून गंगेला जाण्यास वाट दिली आहे कीं काय असा भास होतो. कारण, दोन टेकड्यांमधला भाग खिंड किंवा दार यासारखा खरोखरी दिसतो व म्हणून गंगाद्वार हे नांव जास्त अन्वर्थक आहे असे आम्ही वर म्हटलेच आहे. गांवच्या वरच्या बाजूला नदीकिनाऱ्यावर उभे राहून उत्तर दिशेकडे दृष्टि फेंकली म्हणजे अद्वितीय देखावा दिसतो. दृष्टि पोचत नाहीं येथपर्यंत सारखी टेकड्यांची रांगची रांग लागलेली दिसते. या टेकड्या एकावर एक अशा सारख्या चढत चढत गेलेल्या आहेत. व आपण दृष्टि कितीही उंच केली तरी या टेकड्या म्हणून संपत नाहीत. अगदी दूरवर डोळे ताणून ताणून पाहिले म्हणजे पांढऱ्या शुभ्र रंगाची पर्वतराजी दिसूं लागते. ही पर्वतराजि आहे किंवा पांढऱ्या ढगाचा समुदाय आहे, याबद्दल भ्रांति उत्पन्न होते. परंतु बर्फाच्छादित म्हणूनच सदाधवल अशा हिमवानाचा हा धवलध्वज होय, अशी खात्री झाली म्हणजे मन सानंदाश्चयत निमग्न होतें. या पर्वतराजीच्या खाली<noinclude>
{{gap}}४२ ]</noinclude>
4bys2tg1ypjr8tg3rc6oh0j8fs5lj2m
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५४
104
110441
230440
2026-05-27T06:53:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230440
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''हरिद्वार.'''}}</noinclude>पाहिले म्हणजे स्फटिकाप्रमाणे शुभ्र असा गंगाप्रवाह दूरपर्यंत दिसतो. गंगेच्या पाण्याइतकें शुभ्र व निर्मल पाणी दुसऱ्या कोणत्याही नदीचें नसेल. मी पहिल्याने हरिद्वारास गेलों तो आक्टोबरमध्यें. तो ऋतु हरिद्वारास जाण्यास सर्वात उत्तम, त्या ऋतूंत येथील हवा फारच चांगली असते. फार थंडीही नाहीं, फार उष्णताही नाहीं. पाणी तर इतकें निर्मळ व स्वच्छ असतें, कीं, गळाभर खोल पाण्यांतसुद्धां एकादी सुई किंवा टांचणी स्पष्टपणे दिसते. या नदीच्या प्रसन्न पाण्याकडे पाहून प्राण्याचे मन प्रसन्न झाल्याखेरीज राहतच नाहीं. एकीकडे त्या हिरव्यागार टेकड्या, व त्याचेच पायथ्याशी शुभ्र दगड, व तो स्फटिकाप्रमाणें शुभ्र पाण्याचा प्रवाह, हा देखावा एकसमयावच्छेदेंकरून पाहिला म्हणजे कसाही मनुष्य असो त्याचा अंतरात्मा गारीगार झाल्याखेरीज रहात नाहीं. त्या पवित्र स्थानीं क्षणभर उभे राहिल्यावर आमचीही तीच अवस्था झाली. हिमालयाचा शुभ्र विस्तार, जणूं कांहीं स्वर्गापर्यंत पोचलेला दिसत होता व त्याची एक सोपानपरंपरा झाली आहे, असा भास होई. गंगा स्वर्गातून आली ती याच सोपानपरंपरेनें आली. ती प्रथम स्वर्गातून शंकराच्या डोक्यावर पडली, तेथून हिमवानाच्या माथ्यावर पडली व तेथून अवनितलाला पोंचून खालीं खालीं जात शेवटीं सागराला मिळाली, असें भर्तृहरीनें वर्णन केलें आहे ते अत्यंत यथार्थ आहे असे मला वाटलें. तसेंच, सृष्टिदेवीचे अद्वितीय देखावे पाहिल्यावर त्यांचें रूपकात्मक वर्णन करण्याची कवीला स्फूर्ति होऊन त्या रूपकात्मक वर्णनाच्याच पुढें पुराणांतील कथा होतात असें जें म्हणतात, त्याचीही सत्यता माझ्या डोळ्यापुढे उभी राहिली. व असलाच एकादा गंगेचा देखावा पाहून महाभारतांतील किंवा रामायणांतील गंगावतरणाची कथा एकाद्या कवीच्या डोक्यांत आली असावी, असे मला त्या वेळीं वाटलें व त्या देखाव्यानें मला माझ्या लहानपणच्या एका अदृष्टपूर्व अनुभवाचे स्मरण झाले. मी लहानपणीं पुण्यांत इंग्रजी शिकण्यास होतो, त्या वेळीं आम्हांला पुण्यास कोंकणांतून येण्याजाण्यास बैलगाडीच्या रस्त्यानं जावें लागत असे. एका मे महिन्यांत आम्ही पुण्याहून निघून आमच्या गांवी जात होतो. वाटेंत आह्मांला प्रचंड सह्याद्रि ओलांडावा<noinclude>{{right|[ ४३ }}</noinclude>
eezmsjstpe0q85e3zqnrzh0cap0q093
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५५
104
110442
230441
2026-05-27T06:57:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230441
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>लागतो. आम्हीं पहांटेच्या सुमारास सह्याद्रीच्या पुष्कळ उंच उंच टेकड्या उतरून एका पर्वताच्या शेवटाला आलों, तों तेथें मीं एक अद्वितीय देखावा पाहिला. त्या दिवशीं धुके फार आलें होतें. आम्ही समोर दिसणारे डोंगर ओलांडून कोंकणाच्या बाजूकडील डोंगरांच्या माथ्यावर आलो मात्र, तों आमच्यापुढे एक अफाट समुद्र पसरला आहे असें आम्हांला वाटलें! तें सर्व जग व्यापणारे धुके थेट समुद्राप्रमाणे भासत होतें. ज्या ठिकाणीं धुके किंचित् कमी दाट होतें तेथें थोडा भूमिभाग दृग्गोचर होत होता. असे भूमिभागाचे लहान लहान तुकडे समुद्रांतील लहान लहान बेटांप्रमाणे दिसत होते. हा विलक्षण देखावा पहात आम्ही किती वेळ तरी उभे होतो. इतक्यांत आमच्यामागें पूर्व दिशेला सूर्यानें आपले डोकें उदयाचलाच्या माथ्यावर काढल्याबरोबर त्याचे किरण त्या हिमतुषारमय समुद्रावर पडूं लागले, तसतसे ते धुकें वितळून आम्हांला समुद्राच्या ठिकाणीं जमीन दिसूं लागली, व या समुद्राचा हा पालट एका क्षणांत झाला. हा विलक्षण देखावा पाहून कोकणप्रांत निर्माण झाल्याची कथा कशी उत्पन्न झाली असेल, याची मला उत्तम कल्पना आली. पूर्वी सह्याद्रिपर्यंत समुद्र होता, म्हणजे सर्व कोंकणाचा भाग जलमय होता. पुढे परशुरामानें आपल्या बाणानें समुद्राचें पाणी मागे हटवून कोंकणाचा भूमिभाग निर्माण केला, अशी दंतकथा आहे. ही दंतकथा मी पाहिलेल्या देखाव्यावर उत्तम रूपक आहे. तेव्हां माझ्यासारख्या प्रत्यक्ष अनुभव आलेल्या एकाद्या कवीनें ही दंतकथा रचली असावी, असे मला त्या वेळीं वाटलें. हरिद्वारच्या गंगाकिनाऱ्यावरील अलौकिक देखावा अवलोकन करून गंगावतरणाची कथा अशीच रूपकानें निर्माण झाली असावी, असे मला वाटतें. ही कथा रामायणांत व महाभारतांत बहुतेक सारखीच आहे. महाभारतांत गंगावतरणाचा अगस्त्य ऋषीनें समुद्र प्राशन करून टाकल्याच्या कथेशीं संबंध जोडला आहे एवढेच. इक्ष्वाकु वंशांत फार प्राचीन काळीं सगर ह्मणून मोठा राजा होऊन गेला. त्याला दोन बायका होत्या. एकीपासून त्याला असमंजस म्हणून चिरकालिक कीर्ति मिळविणारा मुलगा झाला, व दुसरीपासून साठ सहस्त्र मुलगे झाले. सगराने एकदां अश्वयज्ञास प्रारंभ<noinclude>
{{gap}}४४ ]</noinclude>
avrn1zrdwka1u8dipvay0tz7iphqq50
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५६
104
110443
230442
2026-05-27T07:01:54Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230442
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''हरिद्वार.'''}}</noinclude>केला. परंतु त्याचा अश्व असूयाप्रेरित इंद्रानें पळवून नेऊन पाताळांत कपिलमहामुनि तप करीत होते तेथे ठेवला. सगरानें आपल्या साठ सहस्र मुलांना अश्वशोधार्थ पाठविलें. त्यांनी अश्वाचा दशदिशा शोध केला तरी त्याचा सुगावा लागला नाहीं. तेव्हां त्यांनीं पित्राज्ञेनें पृथ्वी खणण्यास प्रारंभ करून ते पाताळापर्यंत खणीत गेले. तेथें त्यांनीं कपिल महामुनि व त्यांचे शेजारी आपला यज्ञाश्व पाहिला. हाच चोर समजून ते त्याच्या अंगावर धावले. कपिल महामुनींना राग येऊन त्यांनीं या साठसहस्र सगर पुत्रांना भस्मसात् करून टाकिलें. इकडे सगर आपले मुलगे अजून कां येत नाहींत अशा विवंचनेत होता. शेवटीं फार काळ लोटला म्हणून त्यानें आपला नातू अंशुमान याला त्यांचे शोधार्थ पाठविलें. तो शोध करीत करीत कपिल महामुनि ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणीं आला व त्यानें त्या मुनीला प्रणाम करून त्यांना कुशल प्रश्न केले व आपल्या चुलत्यांची माहिती विचारली. तेव्हां कपिल महामुनि संतुष्ट होऊन त्यांनी त्याला अश्व परत दिला व सगराच्या भस्मसात् झालेल्या मुलांच्या उद्धाराकरितां गंगा पातालाप्रत आणण्यास सांगितलें. अश्व परत आल्यावर सगराने आपला यज्ञ पुरा केला. अंशुमानाला गंगा खालीं कशी आणावी हे समजलें नाहीं. पुढे त्याला दिलीप म्हणून मुलगा झाला, त्यानेंहि गंगा आणण्याची खटपट केली, परंतु त्याचेही हातून सगरपुत्रांचा उद्धार झाला नाहीं. परंतु दिलीपाचा मुलगा भगीरथ म्हणून होता. हा फार धार्मिक व दृढनिश्चयी होता. त्याने आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्याचा निश्चय केला व त्याकरितां त्याने घोर तप आरंभले. त्या तपानें प्रसन्न होऊन गंगेने पातालामध्ये जाण्याचें कबूल केलें. परंतु "स्वर्गाहून खालीं पडतांना माझा वेग पृथ्वीला सहन होणार नाहीं. तरी तूं शंकराची आराधना करून त्यांना आपल्या डोक्यावर मला घेण्यास विनंति कर." असें गंगेनें सांगितलें. गंगेच्या सांगण्याप्रमाणें भगीरथाने पुनः तप करून शंकराला प्रसन्न करून घेतलें. शंकरही त्याच्या तपानें प्रसन्न होऊन त्यानें गंगेला धारण करण्याचें कबूल केलें. त्याप्रमाणें प्रथमतः गंगा स्वर्गातून शंकराच्या डोक्यावर पडली, तेथून हिमालयाच्या माथ्यावर पडली, तेथून जमिनीवर फार<noinclude>{{right|[ ४५ }}</noinclude>
q6s6hdnreq9bhmduq41g2u0l19y4kag
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५७
104
110444
230443
2026-05-27T07:07:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230443
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>वेगाने आली व पुढें भगीरथाच्या रथाचे मागोमाग समुद्रापर्यंत जाऊन पुढे पाताळांत गेली. तेथे भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या भस्मावर गंगाजल शिंपडलें व त्यांना जलदान केलें. व त्या योगानें ते सर्व स्वर्गाप्रत गेले. गंगावतरणाची ही कथा म्हणजे स्वाभाविक दिसणाऱ्या सृष्टीच्या देखाव्यावर एक प्रकारचे कविकृत रूपक आहे असे कोणास वाटणार नाहीं ? असो.
{{gap}}आतां आपण हरिद्वारच्या प्रेक्षणीय स्थळांकडे वळू. येथलें पाहिलें प्रेक्षणीय स्थळ व अत्यंत पवित्र स्थान म्हणजे 'हरीकी पायरी' होय. हा स्नानाचा घाट आहे व याच्या एका भिंतींच्या एका कोनाड्यांत विष्णूच्या पादुका असलेला एक दगड बसविलेला आहे. हा घाट पूर्वी फार लहान होता. त्याला ३९ पायऱ्या होत्या व तो ३४ फूट लांब होता. सर्व यात्रेकरूंची इच्छा या घांटावर येऊन स्नान करण्याची असते. यामुळें येथें अत्यंत गर्दी होते. १८२० मध्ये मोठ्या यात्रेच्या प्रसंगी गर्दीने ४३० माणसे मेली. तसेच पुष्कळ माणसें वारंवार बुडून मरत; म्हणून सरकारने हा घांट साठ पायऱ्यांचा व शंभर फूट लांबीचा केला. १८९२ मध्यें येथें कालराही फार झाला होता. याकरितां हरिद्वार इंप्रुव्हमेंट सोसायटी काढण्यांत आली व तिनें पुष्कळ सुधारणा घडवून आणल्या. सर्व नदीकिनारा व नदीचा तळ फरसबंदी केला. या घाटावर नेहमी पाण्याचा सारखा व बेताचा प्रवाह येईल, अशी तजवीज केली. गंगानदी पर्वत सोडून मैदानावर या ठिकाणीं एकदम पसरते; यामुळे तिचे येथें पुष्कळ फांटे झालेले आहेत. पश्चिमेकडच्या फांट्यावर हरिद्वार आहे. आक्टोबरमध्ये जेव्हां मी हरिद्वारास गेलों होतों, तेव्हां या घांटाजवळ मुळींच पाणी नव्हतें. हा सर्व भाग पांढऱ्या दगडांनीं युक्त दिसत होता. नदीचा प्रवाह या ऋतूंत अत्यंत कमी होतो. पण या दिवसांत गंगेचें पाणी फारच सुंदर दिसतें. या ऋतूंत स्नान करण्याकरितां घाटाजवळचा किनारा सोडून जरा पलीकडच्या प्रवाहाकडे जावें लागतें. परंतु या खेपेला जेव्हा मी हरिद्वारला आलों, तेव्हां सर्व फांटा तुडुंब भरून चालला होता. ज्याप्रमाणे वर्षाकालांत आपल्या इकडे नद्या दुथडी भरून वेगानें जातात,<noinclude>
{{gap}}४६ ]</noinclude>
e0b1hjlfowvtz0qqzala3jhd86ql8gx
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५८
104
110445
230444
2026-05-27T07:11:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230444
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''हरिद्वार.'''}}</noinclude>त्याप्रमाणे या वेळी गंगानदी भरून चालली होती. हा देखावा पाहून मला विलक्षण आश्चर्य व कौतुक वाटलें. ज्या वेळीं सर्व ठिकाणी पाण्याची टंचाई होते, ज्या कालांत सर्व नद्यांना पाण्याचे दारिद्र्य येते, त्याच भर उन्हाळ्याच्या दिवसांत या नदीला मोठा पूर आलेला पाहून प्रथमच उत्तर हिंदुस्थानांत जाणाराला याचें फारच आश्चर्य वाटतें. पण या पुराचे कारण उघड आहे. उष्णतेमुळे हिमालयावरील बर्फ भराभर वितळू लागतें व त्यामुळे या नदीला मोठा पूर येतो. हिमालयांतून निघणाऱ्या सर्व नद्यांचा हाच विशेष आहे. हरिद्वारच्या ऋतुभेदामुळे झालेल्या विपर्यासाकडे पाहून मला सानंद आश्चर्य वाटलें व उत्तररामचरित्रांतील 'पुरा यत्र स्रोतः पुलिनमधुना तत्र सरिताम्' या श्लोकाची आठवण झाली. मात्र या ठिकाणी 'पुरा यत्रारोहः सलिलमधुना तत्र सरिताम्' असा प्रकार झाला होता. हरिद्वाराच्या देवळांमधील सर्वात मोठे व महत्त्वाचें देऊळ गंगाद्वार हे या शेजारीच आहे. हरीकी पायरीचा देखावा खरोखरच अवर्णनीय आहे. प्रत्यक्ष पाहिल्याखेरीज त्याच्या सौंदर्याची कल्पना करता येणार नाहीं.
{{gap}}याच्या दक्षिणेस एकसारखा विटांची फरशी केलेला अर्वाचीन तऱ्हेचा प्लॅटफॉर्मवजा घांट आहे व त्याचे एका बाजूला नदीचा प्रवाह व एका बाजूला धर्मशाळा व देवळें लागतात. काशी किंवा मथुरा या ठिकाणीही असाच देखावा आहे खरा, तरी पण तेथे घांटाघांटाचा संबंध नाहीं; या मुळे नदीकिनाऱ्याला सारखें फिरतां येत नाहीं. हरिद्वाराचा हा एक विशेष आहे. या ठिकाणी सायंकाळी फिरावयास येण्याची फार मौज वाटते. आमचा येथें मुक्काम असेपर्यंत रोज सायंकाळी येथे सहल करण्यास येण्याचा आमचा परिपाठ असे. एकीकडे तुडूंब भरून वेगानें धावणारी प्रचंड नदी व दुसरीकडे निरनिराळ्या तऱ्हेच्या सारख्या लागलेल्या इमारतींचा देखावा व उत्तरेस तो हिमाच्छादित धवलगिरी! हा देखावा अद्वितीय दिसतो व या ठिकाणापासून केव्हांही हलूं नये असें वाटतें. इतर सर्व पवित्र स्थानांपेक्षां हरिद्वारचा हाच विशेष आहे कीं, त्या ठिकाणीं धार्मिक पावित्र्य व सृष्टिसौंदर्य यांचा पूर्ण मिलाफ झालेला आहे आणि<noinclude>{{right|[ ४७ }}</noinclude>
a6m1m0zxgnqb6hih136sxzkcdyngts5
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५९
104
110446
230445
2026-05-27T07:15:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230445
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>यामुळे हे स्थान केवळ धर्मश्रद्ध लोकानांच प्रिय होतें असें नाहीं, तर तें आमुच्यासारख्या माणसासही अत्यंत प्रिय वाटतें व अशा ठिकाणीं वर्षांचे कांहीं दिवस घालवितां आले, तर ती महद्भाग्याची गोष्ट होय, असें वाटू लागतें. असो.
{{gap}}हरिद्वारमधले दुसरें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गांवावरून उत्तरेच्या बाजूला जाणारा रस्ता व तेथल सृष्टिसौंदर्य होय. हाही देखावा अवर्णनीय आहे. गांवाला लागूनच टेकड्या आहेत हे वर सांगितलेच आहे. या टेकड्यांना लागूनच केव्हां केव्हां टेकड्यांचा भेद करून व केव्हां केव्हां बोगदा पाडूनच डेहराडूनचा रस्ता गेला आहे. एकीकडे हा नागमोडीचा रस्ता व त्याच्या पलीकडे प्रचंड टेकड्या आणि दुसऱ्या बाजूला गांव व दुथडी भरून वहात जाणारी नदी हा देखावा प्रेक्षणीय आहे. गांवाजवळ रेलवेचा एक लहानसा बोगदा आहे त्यामुळे रस्ता सुंदर दिसतो. टेकड्या सर्व खडकाच्या आहेत. या सर्व डोंगरांत लहान लहान गुहा व पर्णकुटिका बांधलेल्या आहेत. या ठिकाणीं बैरागी व तपस्वी लोक राहतात. हा देखावा पाहून पुराणांतरींच्या ऋषींची व त्यांच्या पर्णकुटिकांची आठवण झाल्याखेरीज रहात नाहीं. व या ऋषींची पूर्वीची राहणी किती साधी असे याची थोडीशी कल्पना येते. जरा पुढे गेलें म्हणजे रेलवेचा एक पूल लागतो व या पुलाखालून गेले म्हणजे भीमघोडा तलाव लागतो, तेथे टेकड्या जरा आंत गेल्यासारख्या आहेत व त्या पोकळींत हा तलाव व जवळचीं देवळें बांधलेलीं आहेत. अशी दंतकथा आहे, कीं, पांडवांपैकी भीमाला गंगावतरणाचे वेळीं येथें घोड्यावर उभे राहण्यास सांगितले होते. त्याच्या घोड्याची लाथ लागून तेथें टेकड्यांमध्यें खांच पडली व तिचा तलाव झाला. या दंतकथेला महाभारतांत किंवा रामायणांत मुळींच आधार नाहीं. आपल्या लोकांना निव्वळ नांवावरून दंतकथा बनविण्याची फार संवय आहे, त्याचेंच हे उदाहरण आहे. हा रस्ता आगगाडीच्या रस्त्याचें बाजूनें डेहराडूनपर्यंत गेला आहे. याच रस्त्यानें बदरीकेदाराला जातात. हरिद्वारहून बदरिकेदारास जाण्यास सुमारे दहा दिवस लागतात. प्रवास पायींच करावा लागतो. या रस्त्यानें मैल सव्वा मैल गेल्यावर गंगेच्या<noinclude>
{{gap}}४८ ]</noinclude>
nboylvh1af9c1r33wbwkfz481obilhy
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६२
104
110447
230446
2026-05-27T07:20:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230446
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''गंगाद्वार.'''}}</noinclude>कालव्याचे काम लागतें. तेथे फार मोठे धरण वगैरे आहे, अशांतला प्रकार नाहीं. पण गंगेचे दोनतीन फांटे होतात. त्या निरनिराळ्या फांट्यांत पाणी विभागून न जातां एकाच पश्चिमेकडच्या फांट्याकडे ओघ वळावा अशी तजवीज केलेली आहे. नदीचें पाणी आणखी उंच व्हावें म्हणून सध्यां कांहीं बांधकाम चाललें आहे तें आम्हीं पाहिलें. याप्रमाणे पाण्याचा ओघ हरिद्वारच्या फांट्यांत आणून हरिद्वारच्या खालीं नदीच्यापासून कालवा वेगळा करून घेतला आहे. असो.
{{gap}}परंतु हरिद्वारचें सर्वात प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कनखल तीर्थ हे होय. कनखल हें गांव हरिद्वारापासून दीड मैलावर आहे. या गांवांत दगडाची फरशी आहे, घरे बऱ्या प्रकारचीं आहेत. बाजारही मोठा असून दिसण्यांत बरा आहे. हरिद्वारापासून कनखलला जाण्यास एक्के मिळतात. ते माणशी एक एक आणा घेतात. तेथें दक्षप्रजापतीचं मोठें देऊळ आहे व नदीच्या तीराला एक लहानसा घाट आहे. किनाऱ्यावर मोठमोठे वडाचे वृक्ष आहेत. या घाटाच्या पायथ्याशीच प्रसिद्ध कनखल तीर्थ आहे. येथल्या गंगेचा देखावा हरिद्वारापेक्षां अगदीच निराळा आहे. येथे नदीचे पात्र फारच रुंद झालेलें आहे व त्याचे निरनिराळे प्रवाह बनलेले दिसतात. येथून टेकड्या बऱ्याच दूर अंतरावर गेल्या आहेत व हरिद्वारप्रमाणे येथे नदीच्या किनाऱ्याला भिडलेलीं अशीं देवळें किंवा घरें नाहींत. मी पहिल्यांदा या क्षेत्रीं जेव्हां आलों, त्या वेळचा देखावा मी आजन्मांत विसरणार नाहीं. नदीच्या घांटाला लागून प्रवाह जोरानें वाहात होता व त्यामुळे पाण्याला फेस येत होता. आधीच गंगेचे पाणी शुभ्र त्यांतच तो फेंस मिसळलेला. बरें किनाऱ्याच्या बाजूला असलेले दगड व गोटेही शुभ्रच. या प्रवाहाच्या समोर व आम्ही ज्या घाटावर बसलों होतों त्याच्या समोरच नदीला एक उंचवटा होता. तो उंचवटा सर्च शुभ्र दगडांनी व गोट्यांनी भरलेला होता व त्यामधून सारख्या शुभ्र पाण्याच्या हजारों धारा खालीं कनखल तीर्थात सळसळ करीत पडत होत्या. यामुळे त्या प्रवाहाला विशेषच शोभा आली होती. सर्व पाण्याकडे नजर ठरत नव्हती. ते हजारों झरे किंवा धारा तर इतक्या वेगानें मुख्य प्रवाहांत<noinclude>{{right|[ ४९ }}</noinclude>
dz1satz36nvehm5u42dxmjm1amdiv0i
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६३
104
110448
230447
2026-05-27T09:18:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230447
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>पडत होत्या की त्या ठिकाणीं लहरींचा भास होत होता. हें स्थान पाहून माझें मन थक्क होऊन गेलें. या ठिकाणीं गडबड किंवा मनुष्यवस्तीचा गंधही दिसून येत नाहीं. सर्व ठिकाण शांतमय भासतें. अशा प्रकारचे ठिकाण समाधीला व मनाच्या एकाग्रतेला फार उत्तम असें वाटतें. आम्ही घांटावर गेलो तेव्हां तेथें कोणीही माणूस नव्हतें. आम्ही त्या देखाव्याकडे किती वेळ पहात होतों याचें आम्हांला भानच राहिलें नाहीं. इतक्यांत आमचा गाडीवाला फार उशीर झाला म्हणून आमचा शोध करीत आला व मग आह्माला निरुपाय म्हणून तेथून पाय काढावा लागला. परंतु तें ठिकाण सोडतांना प्रियजनांचा वियोग होतांना ज्या प्रकारची मनाची स्थिति होते तशी आमच्या मनाची स्थिति झाली. दुसऱ्या खेपेला जेव्हां आम्ही कनखल तीर्थाला आलो तेव्हां तो पूर्वीचा देखावा गुप्त झाला होता. आक्टोबरमध्ये 'हरिकी पायरी' चा घाट शुष्क व जलविहीन होता, तर कनखल तीर्थ जलपूर्ण व आपल्या पूर्ण वैभवांत होतें. मेमध्ये आह्मी गेलों तो 'हरिकी पायरी' जलमय झालेली व आपल्या पूर्ण वैभवांत होती, तर कनखल तीर्थ अगदी शुष्क जलहीन होतें. तेव्हां या असल्या पवित्र स्थानांनासुद्धां 'नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण' याप्रमाणे वागविणाऱ्या दैवाच्या फेऱ्यानें सोडिलें नाहीं, हें पाहून एक प्रकारचा खेद वाटला व ऋतुमानानें या प्रेक्षणीय स्थळांत होणाऱ्या विपर्यासाचें सखेदाश्चर्य वाटलें. तरी पण कनखल तीर्थाचे ठिकाणीं गेलें म्हणजे आपण मूर्तिमंत शांततेच्या ठिकाणीं आलों आहोत, असें वाटल्याखेरीज रहात नाहीं.
{{gap}}येथील तिसरे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे मयापूर हें होय. येथे एकदोन फार जुनीं देवळें आहेत. एक देऊळ बुद्ध देवाचें स्थान ह्मणून सांगतात. हें दुसऱ्या एका बाजूनें येणाऱ्या मोठ्या ओढ्याच्या कांठीं आहे व येथला देखावा बरा आहे. परंतु देऊळ फार जुनें आहे असें आह्मांला वाटलें नाहीं. असो.
{{gap}}अशीं निरनिराळीं प्रेक्षणीय स्थळे पाहण्यांत व रोज सायंकाळीं गंगेच्या किनारी सहल करण्यांत आमचा आठवडा मोठ्या आनंदानें गेला. येथें<noinclude>
{{gap}}५० ]</noinclude>
0t2198sqlt4z0hlp76exj4znq4m46li
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६४
104
110449
230448
2026-05-27T09:23:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230448
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''गंगाद्वार.'''}}</noinclude>आमची जेवणाची सोय उत्तम जमत असे हें वर सांगितलेच आहे. येथला बाजार बराच मोठा आहे व सर्व जिन्नस येथे चांगले मिळतात. दूधदहीं तर फारच चांगलें असतें. दक्षिणेतून इकडे प्रथमच येणाऱ्याला येथल्या बाजारांतील एका चालीचे आश्चर्य वाटते. येथें सर्व जिनसा वजनी मापानें विकतात. तांदूळ तोलून घ्यावे लागतात! डाळ तोलून घ्यावी लागते! आटा तोलून घ्यावा लागतो! हिरवे आंबेसुद्धां तोलून घ्यावे लागतात! सारांश, या बाजारांत मापीवजन किंवा संख्यामोजणी ठाऊकच नाहीं, असें वाटतें. या ठिकाणीं साधुसंत असल्यामुळे म्हणा किंवा प्रघात आहे म्हणून म्हणा, येथें खडावा फार चांगल्या मिळतात. एका पांढरट तांबूस दगडाच्या दगड्या वगैरे पदार्थही पुष्कळ मिळतात. बाकी म्हणण्यासारखा व्यापार या गांवाला नाहीं.
{{gap}}कनखल, हरिद्वार व ज्वालापुर हीं तीन गांवें मिळून 'हरिद्वार युनियन' म्हणून एक म्युनिसिपालिटी आहे. ही तिन्हीं गांवे आरोग्याच्या दृष्टीनें फार चांगलीं आहेत. मथुरा किंवा काशीसारखी येथें घाण किंवा दुर्गंधी मुळींच नाहीं. सर्व घरें अगदीं स्वच्छ आहेत व गांवांत किंवा नदीत कोठेही घाण नाहीं. येथें नदीचा प्रवाह जोराचा असल्यामुळे नदींत घाण राहू शकत नाहीं. बारा वर्षांनी येथें मोठा कुंभमेळा भरतो, त्या वेळीं फार मोठी यात्रा भरते. बाकी या ठिकाणी बाराही महिन्यांत निरनिराळ्या प्रांतींचे यात्रेकरू दृष्टीस पडतात. उत्तरहिंदुस्थानांत सर्व पवित्र स्थानांत स्वच्छता व सृष्टिसौंदर्य या बाबतींत या क्षेत्राचा पहिला नंबर लागेल असे मला वाटतें.
{{gap}}या ठिकाणचे शब्दांनीं यथार्थ वर्णन करणें अशक्य आहे. हे ठिकाण प्रत्यक्ष पाहिल्यावांचून त्याचें महत्व कधींही कळावयाचें नाहीं. तरी वाचकांना अशा पवित्र स्थानाचें दर्शन पूर्ववयांत घेण्याची बुद्धि होवो अशी इच्छा प्रदर्शित करून हें हरिद्वारचें वर्णन संपवितो.{{nop}}<noinclude>{{right|[ ५१ }}</noinclude>
ilfmlkdaxxyovv77y8rt7zzy0rwtr26
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६५
104
110450
230449
2026-05-27T09:29:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230449
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf
|Page = 65
|bSize = 498
|cWidth = 380
|cHeight = 83
|oTop = 27
|oLeft = 56
|Location = center
|Description =

{{x-larger|{{center|'''{{bar|1}}४{{bar|1}}
गुरुकुल.'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}मी उत्तर हिंदुस्थानांतील प्रवासास सुरवात केली तेव्हांपासून 'गुरुकुल' ही संस्था पहाण्याचा माझा मानस होता; परंतु पहिल्या प्रथम मी हरिद्वारला गेलों तेव्हां तेथे मी फक्त दोनच दिवस होतों. ते दोन दिवस तेथील अवर्णनीय सृष्टिशोभा पाहाण्यांत केव्हांच निघून गेले. तेव्हांसुद्धां मी गुरुकुलाबद्दल चवकशी केली; परंतु मी एका फक्त हिंदी जाणणाऱ्या जुन्या तऱ्हेच्या पंड्याकडे उतरलों असल्यामुळे मला आधीं बरोबर माहिती मिळाली नाहीं; शिवाय जी मिळाली त्यांत हरिद्वारापासून गुरुकुल पांच मैल आहे असे कळलें. तेव्हां इतक्या लांब जाऊन येण्यास व ती संस्था सावकाशपणे अवलोकन करण्यास सवड सांपडणार नाहीं, असें दिसून आलें. म्हणून मनांतील उत्कंठा दाबणे भाग पडलें; पण ती संस्था उभ्या उभ्या व अगदीं तांतडीनें पाहून जाणें बरोबर नव्हे, असेंही मनाला वाटलें. कारण या संस्थेबद्दल व तिच्या उत्पादकाच्या आत्मत्यागाबद्दल वर्तमानपत्रांत किती तरी वेळां मी वाचलें होतें. शिवाय, पंजाबांतील आर्यसमाजाची ही संस्था असल्यामुळें या पंथांतील लोकांमध्ये तिच्याबद्दल विलक्षण उत्साह, अभिमान व आदर वसत आहे; गुरुकुलाच्या वार्षिक उत्सवप्रसंगीं हजारों स्त्रीपुरुष तेथे जमतात व दरवर्षी अर्धा अर्धा लाख रुपये रोख जमा होतात, असें मीं ऐकिलें होतें. तेव्हां अशी महत्वाची संस्था ज्या वेळीं मला वेळ अगदी थोडा होता त्या वेळीं पाहिली नाहीं, हें एका अर्थी बरें झालें.{{nop}}<noinclude>
{{gap}}५२ ]</noinclude>
eexetk90m53jit0ed3mxtapp827xjq2
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६६
104
110451
230450
2026-05-27T09:33:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230450
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''गुरुकुल.'''}}</noinclude>{{gap}}एके दिवशी सायंकाळी आम्ही एक्क्यांत बसून कनखल तीर्थाला गेलो होतों. तेथील सर्व देवळें पाहिल्यावर आम्ही थोडा वेळ घांटावर जाऊन बसलों, व गंगेच्या प्रचंड पात्राकडे, त्याचप्रमाणं दृष्टि पोहोचेपर्यंत हिमालयाच्या उंचउंच पर्वतराजांकडे पहात होतों. याप्रमाणें थोडा वेळ गेल्यावर मुक्कामाला परत फिरण्याचे आधी आम्ही "गुरुकुल कोठें आहे, त्याला रस्ता कोणता, तेथे केव्हां जावें, गाडी वगैरे जाते किंवा नाहीं?" वगैरे गोष्टींची चवकशी आमच्या मोडक्यातोडक्या हिंदी भाषेत करीत होतों; इतक्यांत एक तद्देशीय गृहस्थ आमच्याकडे आले व त्यांनी "तुम्हांला गुरुकुल पहावयाचें आहे काय?" असा इंग्रजीत प्रश्न केला.
{{gap}}हा प्रश्न ऐकून आम्हांला स्वाभाविकच आनंद झाला व भाषेसंबंधीं अडचणही दूर झाली. आम्हीं त्या गृहस्थाला म्हटलें कीं, "आम्हांला गुरुकुलास जावयाचे आहे व आम्ही त्याबद्दलच चवकशी करीत आहों."
{{gap}}ते गृहस्थ म्हणाले "गुरुकुलांतील एक प्रोफेसर आतां येथेंच आहेत, व ते दक्षिणी गृहस्थ असून त्यांनी मला आपल्याला विचारण्यास पाठविलें आहे. तेच आले असते, परंतु आपल्याला बरें वाटेल किंवा नाहीं ही शंका येऊन ते आले नाहींत."
{{gap}}हे ऐकून आम्हांला फारच आनंद झाला. विशेषतः इतक्या दूरच्या प्रदेशांत आपली भाषा बोलणारे व आपल्याच देशांतील गृहस्थ येथें शिक्षक आहेत, हें ऐकून तर आमचा आनंद गगनात मावेना! आतां आपल्याला गुरुकुलाची सर्व माहिती मिळून पाहण्यासंबंधी कांहींएक अडचण राहणार नाहीं असें वाटून, आम्ही फार सुदैवी म्हणून सहजगत्या असा योग आला, असे आम्हीं ह्मटलें. इतकें बोलणें झाल्यावर आह्मी त्या गृहस्थाबरोबर देवळाच्या लतामंडपानें सुशोभित केलेल्या एका ओरीकडे गेलों. तेथे एका साधारण ठेंगण्या, पण तेजस्वी व पाणीदार गृहस्थाला पाहिलें. त्यांचा आमचा परिचयविधि झाला. प्रो. व्ही. जी. साठे<noinclude>{{right|[ ५३ }}</noinclude>
t6t3wi4mv3mnjlm28wuud5otk63jtsr
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६७
104
110452
230451
2026-05-27T09:37:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230451
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>हे मुंबईकडील राहणारे आहेत व ते स्वतः एम्. ए., असून त्यांचे बंधु पूर्वी आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेचे प्रिन्सिपाल होते व हल्ली मुंबईस वकिलीचा धंदा करतात, असें समजलें. शिवाय, प्रो. साठे यांनी मला मुंबईस एकदोन वेळां पाहिलें होतें. याप्रमाणे ओळख निघाल्याने विशेषच आनंद झाला, व आह्मांला सर्व गोष्टी आपल्याच भाषेच्या द्वारें ठरवितां आल्या. प्रो. साठे यांनी दुसऱ्या दिवशीं सकाळींच गुरुकुल पाहाण्यास येण्याबद्दल व तेथें सबंध दिवस राहून सायंकाळी परत फिरण्या बद्दल आह्यांला सुचविलें, व सात आठांच्या सुमारास आपला मनुष्य वाटेवर ठेवतों, असें आश्वासन दिले. इतकी आमच्याकरितां तसदी घेतल्याबद्दल व सुदैवाने अशी अचानक गांठ पडून ओळख झाल्याबद्दल आनंद प्रदर्शित करून व प्रो. साठे यांचे आभार मानून आह्मी प्रमुदित मनाने आमच्या निवासस्थानास परत आलो. मुक्कामाला येतांच आमच्या अर्वाचीन स्थालीची आराधना करून तींत अन्न शिजण्यास लावून नित्य क्रमाप्रमाणे आह्मी गंगेच्या घांटावर सहल करावयास गेलो.
{{gap}}या वेळची घांटाची शोभा अवर्णनीय असते. आधी सर्व घांट माणसांनी फुललेला असतो. निरनिराळ्या देवळांतून देवांची पूजा व आरती चालू असते, व निरनिराळ्या आवाजाच्या घंटांचा नाद चालू असतो. सर्व ठिकाणी यात्रेकरूंची सारखी गर्दी असते. 'हरीकी पायरी'च्या वांटावरील गर्दी तर विचारूच नका! आरतीच्या दीपावलीचा प्रकाश प्रवाहावर पडून त्या प्रवाहाला जास्तच शोभा आली होती. आधी हरिद्वारास होतों ते दिवस चांदण्याचे नव्हते; परंतु चांदण्याच्या दिवसांत व विशेषतः पौर्णिमेच्या सुमारास नदीवरील व घांटावरील देखावा यापेक्षांही सुंदर दिसतो, असें आह्मांला सांगण्यांत आले व त्याचे थोडेसे प्रत्यंतर आह्मांला आमच्या हरिद्वारच्या आठवड्यांतील शेवटच्या एकदोन दिवशीं आलें. कारण, त्या दिवसांत थोडासा चंद्रप्रकाश पडूं लागला होता. घाटावर बसून धो धो वाहणाऱ्या गंगाप्रवाहांत पाय सोडून बसण्याची फारच मौज वाटते. ते उन्हाळ्याचे दिवस, तरी पण अशा तऱ्हेनें फार वेळ पाण्यांत पाय सोडून बसवत नाहीं. अर्धापाव तास बसलें कीं, सर्व उष्मा नाहींसा<noinclude>
{{gap}}५४ ]</noinclude>
qhd3envhod4wixwby8t7ml6civfxd12
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६८
104
110453
230452
2026-05-27T09:46:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230452
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''गुरुकुल.'''}}</noinclude>होई व दिवसाचा सर्व थकवा जाऊन मन फार प्रसन्न होई. घांटावर इकडे तिकडे सहल करून मग थोडा वेळ पाण्यांत पाय सोडून बसण्याचा आमचा रोज परिपाठ पडला होता. अशा वेळीं नानातऱ्हेचे विचार मनांत येत व पूर्वीच्या ऋषींनी हिमालयासारखी ठिकाणें तपाला उत्तम हणून कां पसंत केली, हें सहज ध्यानांत येई. मनुष्याचे मन धर्मपरायण व ईश्वरपरायण बनण्यास, मनाची एकाग्रता साधण्यास, आत्म्याची समाधी लागण्यास, ह्रीं शांत, गंभीर स्थाने फारच अनुकूल होत, यांत मुळींच शंका नाहीं.
{{gap}}याप्रमाणें बराच वेळ गंगानदीची शोभा पाहून व तिचा सुखकर स्पर्श अनुभवून आह्मी परत येतों, तो आमच्या दिव्य स्थालीने आमची पाकनिष्पत्ति उत्तम तऱ्हेची करून ठेविली होती. लवकरच भोजन आटोपून आम्ही गच्चीवर निजण्यास गेलो. इकडल्या तिकंडल्या गोष्टी बोलत असतांना व उद्या आपल्याला गुरुकुल पहावयास जावयाचे आहे या आनंदमय विचारांत असतांना, आहांला निद्रादेवीनें मोहून टाकले व लवकरच आह्मांला गाढ झोप लागली.
{{gap}}आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे आम्हीं पहांटेस पांच वाजतां उठलों, व गुरुकुलास जावयाचें तें स्नान करूनच जावें म्हणजे बरोबर कपडालत्ता नेण्याचा त्रास नको, असा विचार करून लागलीच गंगेवर सानास गेलों. स्वच्छ गंगास्नान करून आणि निवळ दुधाचा चहा घेऊन आम्ही एक्क्यामधून सुमारे सहा साडेसहाला कनखल तीर्थाला आलो. गुरुकुलचा रस्ता या तीर्थाच्या खालच्या बाजूनेच जातो, व तो सर्व नदीच्या वाळवंटांतून जात असल्यामुळे आह्मीं सर्व रस्ता पाहात पाहात व चालत चालत जाण्याचा बेत केला होता. ह्मणून एका देवळाशींच सोडला, व आह्मी वाट चालू लागलो.
{{gap}}कनखलापासून गुरुकुलाचें ठिकाण तीन मैल आहे. परंतु बहुतेक सर्व रस्ता नदीच्या पात्रांतूनच जातो. कारण, हरिद्वारच्या खाली गंगानदीचें पात्र फारच रुंद झालेले आहे व तिचे निरनिराळे प्रवाह बनलेले आहेत. ज्याप्रमाणें एखादी अल्लड हरिणी अथवा कालवड<noinclude>{{right|[ ५५ }}</noinclude>
2jzwz4ipdg7dsx8wiiqyftf0yt94ssa
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/६९
104
110454
230453
2026-05-27T09:54:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230453
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>गोठ्यांतून बाहेर पडली म्हणजे सैरावैरा धावू लागते, त्याप्रमाणें येथें गंगेची स्थिति होते. हरिद्वाराजवळ तिला दोन टेकड्यांचा प्रतिबंध आहेसा दिसतो; परंतु हिमालयाच्या पर्वतराजीरूपी कोंडवाड्याच्या शेवटच्या दारांतून मोकळ्या मैदानावर गंगा आली ह्मणजे तो सैरावैरा धावत आहे कीं काय, असा भास होतो. कनखल तीर्थाच्या खालींच गुरुकुलची वाट नदीच्या पात्रांतून लागते. गंगेच्या पात्रांत बहुतेक दगड शुभ्र आहेत. परंतु मधून मधून निरनिराळ्या रंगांचे दगडही दृष्टीस पडतात. तांबडा, पिवळा, हिरवा, निळा, काळा, वगैरे निरनिराळ्या रंगांच्या व त्यांच्या निरनिराळ्या छटांच्या गोट्यांनी भरलेले पात्र पाहून प्रथमतः पहाणाराला आश्चर्य वाटतें. कारण, आपल्या इकडे सर्व नद्या एकाच काळ्याकुट्ट गोट्यांनीं भरलेल्या असतात. त्यांत वैचित्र्य फारच क्वचित् असतें. अशा प्रकारची मौज व दगडांचे वैचित्र्य नर्मदा नदीच्या पात्रांत व विशेषतः जबलपुरनजीक मार्बल रॉक्स ह्मणून जो नदीचा भाग आहे, त्यामध्यें दिसून येते. लहान मुलांना वाळूतील शिंपा वेचण्याची जशी हौस वाटत असते, त्याप्रमाणें गंगेच्या या पात्रांतून जातांना मोठ्या माणसांनाही दगड वेचण्याची हौस वाटते. निरनिराळ्या रंगांचे गोटे गोळा करण्याची तशी हौस आह्मालाही वाटली, व खरोखरीच आह्मीं प्रत्येकाने हातरुमालांत मावतील इतके गोटे गोळा केले. परंतु फार जड झाल्यामुळे आह्मांला त्यांतले बरेच 'समुद्रास्तृप्यंतु' नव्हे 'नदास्तृप्यंतु' करावे लागले. तरी पण, सरासरी हातरुमालभर गंगेतील गोटे आम्ही पुण्यास आणलेच!
{{gap}}गंगेच्या पात्राची शोभा पाहात, व उत्तरेची दिशा भरून टाकणाऱ्या हिमालयाची दूरस्थित रांगची रांग निरखीत आणि नकळत भूगर्भशास्त्रज्ञाप्रमाणे निरनिराळ्या जातीचे दगड जमवीत चालल्यामुळे आमचा प्रवास फार धीरेधीरे होत होता. कनखलपासून गुरुकुलाला पोहोंचेपर्यंत वाटेंत लहान मोठे असे नदीचे पांच प्रवाह लागतात. त्या पांचांवरही लहान मोठे पूल केलेले आहेत. पूल कच्चे आहेत. दोन पूल जरा मोठे आहेत. ते होड्या एकापुढें एक ठेवून, त्या होड्या दोरखंडांनीं जखडून त्यावर लांकडाचे ओंडे टाकून, त्या ओड्यांवर आडव्या फळ्या व वांसे बांधून<noinclude>
{{gap}}५६ ]</noinclude>
e38lzjzmny6mjyrnacvazk0l5bbj7hz
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/७०
104
110455
230454
2026-05-27T10:00:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230454
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''गुरुकुल.'''}}</noinclude>त्यांवर गवत पसरून वर मातीचा थर देऊन सरासरी गाडी जाण्यापुरते कच्चे पूल केलेले आहेत. कांहीं पूल तर दोन चार लांकडाचे ओंडे टाकूनच केलेले आहेत. कारण, प्रवाहाची धार फारच लहान आहे.
{{gap}}हे सर्व कच्चे पूल पाहिले ह्मणजे पुढे येणाऱ्या गुरुकुलाच्या साधेपणाचीच साक्ष पटते, व आपण सृष्टिकृतीत अवश्य तितक्याच भर घातलेल्या स्थलाकडे जात आहों असें वाटतें. गंगेचा सर्वात मोठा जो प्रवाह आहे, व ज्यावर बराच लांब पण कच्चाच पूल आहे, तो ओलांडल्यावर तरीचे नाके लागतें. व तेथें दरमाणशी एक पैसा तरभाडें द्यावें लागतें. या ठिकाणीच प्रो. साठे यांनी वाट दाखविण्याकरितां पाठविलेला मनुष्य आह्मांला भेटला.
{{gap}}हा प्रवाह टाकल्यावर नदींत बनलेलें एक बेट लागतें. या बेटावर जंगल साधारणच आहे. फार उंच किंवा फार दाट झाडी नाहीं. पुढें लवकरच शेवटचा प्रवाह ओलांडून आपण गुरुकुलाच्या मर्यादेत प्रवेश करतो. परंतु गुरुकुल जवळ आल्याचे एकही चिन्ह दिसत नाहीं. फक्त एक दूरवर निशाण दिसतें. त्या खुणेनेंच जावयाचें असतें. थोड्याच वेळानें आपण तीनशे साडेतीनशे मनुष्य वस्तीच्या खेड्यासारख्या ठिकाणीं जाऊं असें वाटत नाहीं. कारण, आतां सर्व भाग जंगलाप्रमाणे भासतो. झाडेही जास्त दाट दिसूं लागतात. हा देखावा गुरुकुलाच्या अगदीं बाहेरच्या कवाडाशीं येईपर्यंत सारखा दिसतो. हें कवाड दिसलें म्हणजे आपण मनुष्य वस्तीत आलों, असा विश्वास पटतो.
{{gap}}आह्मी कवाडांतून आत शिरलों तो दोन्ही बाजूंना एकेरी खोल्या- खोल्यांसारख्या जागा दिसल्या. याच विद्यार्थ्यांच्या जागा कीं काय, असा प्रथमतः आह्यांला संशय आला; परंतु त्या गोशाळेच्यापैकीं होत, असें पुढे समजलें. हे पहिलें कवाड टाकून बरेंच आंत गेल्यावर गुरुकुलाचें दुसरें फाटक लागते. वाटेने जातांना संस्कृत शब्दांनी व्यक्त केलेल्या इंग्रजी खेळाच्या निदर्शक पाट्या लागतात. या खेळण्याच्या जागा दाखविणाऱ्या पाट्या होत्या.
{{gap}}दुसऱ्या फाटकाच्या आंत गेल्याबरोबर गुरुकुलाची बाग लागते. ही<noinclude>{{right|[ ५७ }}</noinclude>
85k4yd3gafqizr1o876l9krimkzi31t
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/७१
104
110456
230455
2026-05-27T10:06:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230455
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>बाग नीटनेटकी, पण अगदी साधी दिसते. येथेच एक मोठी विहीर असून तिला भलाथोरला एक बैलरहाट जोडलेला आहे. या रहाटाच्या योगेच सर्व बागेला पाणी दिलें जातें व स्नानशाळेला येथून पाणी जाते. जरा पुढे गेलें की स्नानशाळा लागते. या शाळेत लांबच लांब व अगदी अरुंद असा मोठा थोरला हौद आहे. आपल्या इकडे गुरांना पाणी पिण्याकरितां ज्या तऱ्हेचा लांबच लांब हौद बांधतात, तशा तऱ्हेचा हा बांधलेला आहे. येथे पन्नास मुलें एकदम स्नान करूं शकतात. बहुधा नदीवर स्नान करण्याचा परिपाठ आहे; परंतु ज्या वेळीं नदीवर जाणे शक्य नाहीं त्या वेळी स्नानशाळेचा उपयोग करतात.
{{gap}}ही शाळा टाकून जरा पुढे गेलें म्हणजे गुरुकुल महाविद्यालयाची इमारत लागते. ही दोन मजली पण अगदी साध्या परंतु पक्क्या बांधणीची इमारत आहे. शहरांतील कॉलेजच्या इमारतींप्रमाणं भव्यता, सौंदर्य किंवा अवाढव्यपणा या इमारतींत मुळींच नाहीं. पण ही इमारत गुरुकुलासारख्या पूर्वकालीन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणाऱ्या संस्थेला साजेशीच आहे. इमारत दुमजली आहे व त्यांत २२ वर्ग बसण्याची जागा असून एक मोठा पुस्तकालयाचा दिवाणखाना आहे व दुसरा शास्त्रीय शिक्षणाचा दिवाणखाना आहे. दुसऱ्या मजल्यावर महाविद्यालयाकडील ब्रहाचारी राहण्याची सोय केलेली आहे. या इमारतीस चाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे. ही इमारत कॉलेजच्या शाखेची होय.
{{gap}}शाळेच्या शाखेकरितां अजून कायमच्या पुऱ्या इमारती बांधलेल्या नाहींत. सर्व ब्रह्मचारी तात्पुरत्या बांधलेल्या एका भव्य चौकांत राहातात. हा चौक फारच मोठा असून त्याचे मधोमध एक मोठी यज्ञशाळा आहे. ती शहरांतील एका उपवनांतील बँडस्टँडसारखी हुबेहुब दिसते. मात्र ही फार मोठी आहे व मधोमध एक यज्ञकुंड आहे. यांत सकाळीं होम होतो व त्या वेळी सर्व ब्रह्मचारी एके ठिकाणी जमून हवन करतात. सायंकाळचा होम वर्गवारीनें व निरनिराळ्या ठिकाणी होतो. या इमारतीला एकंदर पसतीस हजार रुपये लागले आहेत. येथे विद्यार्थ्यांच्या राहाव-<noinclude>
{{gap}}५८ ]</noinclude>
ar6ur2iqwp70stf0ub62v40ab833u84
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/७२
104
110457
230456
2026-05-27T10:11:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230456
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''गुरुकुल.'''}}</noinclude>याच्या खोल्या, शाळेच्या खोल्या, व दवाखाना, स्वयंपाकघर व भोजनशाळा इतक्या इमारती आहेत. या इमारती एकमजली असून सोपा व त्याचेपुढे खुली पडवी, अशा धर्तीच्या आहेत. वर पत्रे घातलेले आहेत. भोजन शाळा फारच विस्तृत आहे. येथे अडीचशेपासून तीनशे विद्यार्थी एकदम भोजनास बसण्याची सोय आहे. परंतु गुरुकुल विद्यालयाची ही चालचलाऊ व्यवस्था आहे. कायमची इमारत बांधण्याचा विचार आहे. त्यांत सहाशे विद्यार्थ्यांची सोय व्हावयाची आहे व त्याला पांच लाख रुपये खर्च येईल असा अंदाज केलेला आहे. गुरुकुलाच्या चालकांचा 'इमारतफंड' जमविण्याचा प्रयत्न चालू आहे.
{{gap}}या इमारतीपासून जरा दूर आनंदाश्रम म्हणून एक लहानशी इमारत आहे. या ठिकाणी अविवाहित शिक्षक राहातात. येथून थोड्या अंतरावर दिल्लीचे सुपरवायझर लाला परमेश्वरी दास यांनी चार हजार रुपये खर्चून एक पक्की धर्मशाळा बांधलेली आहे. गुरुकुल पहाण्यास सहकुटुंब येणाऱ्या गृहस्थास येथे उतरण्याची सोय आहे. शिवाय प्रोफेसर, शिक्षक, सुपरवायझर यांच्या कुटुंबाकरितां स्वतंत्र घरे बांधलेली आहेत. गुरुकुलाचे मुख्य आचार्य यांच्याकरितां एक स्वतंत्र आश्रम बांधलेला आहे.
{{gap}}गुरुकुलाचें आवार फारच विस्तृत आहे. हे एक लहानसे खेडेंच आहे. ही जागा पूर्वी निवळ जंगल असून येथें पशूंचे वसतिस्थान होतें. परंतु या स्थळाचा देखावा मात्र सुंदर आहे. हे ठिकाण गंगेच्या डाव्या तीरावर आहे. येथें हवा फारच चांगली असून गंगेचा प्रवाह जवळच वहात असल्यामुळे प्रवाहावरून नेहमीं गार वारा येत असतो. येथून हिमालयाच्या पर्वतराजी सारख्या दिसत असतात. सर्व जागा झाडांनी आच्छादलेली आहे.
{{gap}}अशी शांत, एकीकडची आणि हवाशीर जागा पाहून महात्मा लाला मुनशीराम हे बारा चवदा वर्षांपूर्वी आपल्या दोन मुलांना घेऊन येथे राहण्यास आले व निवळ जंगलांत त्यांनी गुरुकुलास आपल्या एकट्याच्या हिमतीवर सुरवात केली. गुरुकुलाची ही जागा, व आपली सर्व इष्टेट श्रीमन्मुनशी अमेनसिंहजी यांनी गुरुकुलास बक्षीस दिलेली आहे. या<noinclude>{{right|[ ५९ }}</noinclude>
2tunm0ih524bn6b66xem8ljl2kpvqfn