विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.4
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
श्रावणमासी हर्ष मानसी
0
2013
230512
223269
2026-05-29T14:43:43Z
~2026-32209-15
6047
मी मराठीचा एक अनुभवी अध्यापक या नात्याने... बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ज्या धरणगाव जि.जळगांव येथे जन्मले, वाढले व इहलोक सोडून अनंतात गेले... ते धरणगाव शहर सध्या तालुक्याचे ठिकाण आहे. त्याच तालुक्यातील चांदसर बु॥ या गावचा मी रहिवासी आहे. बालकविंची मूळकविता जशी असायला हवी, तशी सर्व लेखनदोष काढून मी संपादित केली आहे. संधी दिल्याबद्दल धन्यवाद.
230512
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = [[श्रावणमासी हर्ष मानसी]]
| साहित्यिक = बालकवी
| वर्ष =
| विभाग =
| मागील = [[आनंदी आनंद गडे]]
| पुढील = [[मंगलमय प्रेमकवन]]
| टिपण =

<poem>
श्रावणमासी हर्ष मानसी

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरूनी उन पडे.
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे.
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर ऊंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभांवर होय रेखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळची ते
उतरूनी येती अवनीवरती ग्रहगोलची की एकमते
फडफड करुनी भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पावा गाई तयाचा श्रावणमहिमा एक सुरे
सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजात हि बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊन हाती पुरोपकंठी शुद्धमती
सुंदर बाला त्या फुलमाला रम्य फुलेपत्री खुडती
देव दर्शना निघती ललना हर्ष मावेना ह्रदयात
वदनी त्यांच्या वाचुन घ्य़ावे श्रावण महिन्याचे गीत
कवी: बालकवी. (त्र्यंबक बापुजी ठोंबरे)
</poem>
{{प्रताधिकार मुक्त साहित्य}}
[[वर्ग: बालकवी यांचे साहित्य]]
[[वर्ग:तपासणी करायचे साहित्य]]
[[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]]
[[वर्ग:मराठी कविता]]
nietzny1ld9e1ay15vui74t6jwsbe9w
अनुक्रमणिका:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf
106
85681
230523
230487
2026-05-30T09:59:54Z
कल्पनाशक्ती
3813
230523
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=माधव रामचंद्र जोशी
|Address=पुणे
|Year=1920
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="अनुक्रमणिका" 6="फोटो" 7="फोटो" 8="नैनिताल" 24="फोटो" 25="फोटो" 29="ग्वालेर" 42="फोटो" 43="फोटो" 48="हरिद्वार किंवा गंगाद्वार" 65 ="गुरुकुल" 85 ="मथुरावृंदावन" 103="कृष्णकथा व वैष्णवपंथ"/>
|Volumes=
|Remarks={{scrollpane|border=1px dashed silver|height=600px|width=400px|
{{पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५}}

|Width=
|Css=
|Header=
|Footer=

nmy1nndt1m6s3k7pyt9qd9akf72l0qw
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९३
104
110479
230513
230511
2026-05-30T09:16:18Z
कल्पनाशक्ती
3813
230513
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>म्हणून दगडाची भव्य कमान १८७० मध्यें मथुरा म्युनिसिपालिटीने बांधली आहे तिचे खालून बाहेर आलों. हा देखावा बराच प्रेक्षणीय आहे.
{{gap}}तेथून आम्हांला आमच्या पंड्यानें येथील मुख्य देऊळ केशव-देव येथे नेले. हे देऊळ साधारण चांगल्यापैकी आहे; परंतु हें अर्वाचीन आहे. केशव देवाचें फार प्राचीन देऊळ औरंगझेबानें नाहींसें करून त्या ठिकाणी मोठां जुम्मा मशीद बांधली. ही मशीद अझूनही जुन्या देवळाच्या चवथऱ्यावर आहे व एकंदरीत पूर्णपणे हिंदु असलेल्या या शहराच्या मध्यभागी औरंगझेबाच्या धर्मवेडाची साक्ष ती सतत देत आहे. या देवळाच्या जवळच पोतारकुंड म्हणून एक तलाव आम्हांला दाखविण्यांत आला व पंड्यानें आम्हांला सांगिलें कीं, या तळ्यांत कृष्णाची लहानपणचीं चिरगुटें धूत असत. त्याच्याजवळ वसुदेव-देवकीचे कारागृह व कृष्णाची जन्मभूमि दाखविण्यांत आली. परंतु ती एकंदर जागा व तिची परिस्थिति पाहून त्याचें म्हणणें सत्य दिसलें नाहीं. पुढे तर आम्हांला असें दिसून आलें, कीं, मथुरावृंदावनांत कोठेही तलाव असो, येथें कृष्णाचीं चिरगुटें धूत असत म्हणून आपले सांगत. कृष्ण ज्याप्रमाणे आपल्या सोळा सहस्र गोपींच्या मनोरंजनाकरितां सोळा सहस्र रूप धारण करीत असे. त्याप्रमाणें भावी पिढीतील भाविक भक्तांच्या समाधानाकरितां जन्मापासून त्यानें हजारों रूप धारण केली होतीं व म्हणून त्याचीं चिरगुटें धुतल्याची साक्ष पटविणारी कुंडें मथुरा वृंदावनांत असंख्य असून तीं हल्लीं पंड्यांना दाखवितां येतात! हें देऊळ व ही जागा मातीच्या एका उंचवट्यावर आहे. मथुरेच्या बाहेर असे मातीचे ढिगारे जागोजाग आहेत. पूर्वीच्या शहराच्या तटापैकीं हा कांहीं भाग आहे, किंवा यमुना नदीचा प्रवाह पूर्वकाळी इकडे असून त्याच्या तीराचे हे भाग आहेत हें सांगतां येत नाही. हें पवित्र स्थान दाखविल्यावर पंड्याने आम्हाला त्याच्या बुद्धीने जास्त पवित्र व पुरातन अशा ठिकाणीं नेले व तेथें कृष्णाचीं वडील माणसें व इतर त्याचे संबंधी दृष्टीस पडतील म्हणून सांगितलें. आह्मीं आतां आपल्याला बऱ्याच पुरातन काळच्या मूर्ति पाहण्यास सांपडतील अशा मोठ्या आशेनें व औत्सुक्याने एका सोप्यावजा दालनांत शिरलों व तेथे आम्हांला वसुदेव,<noinclude>
{{gap}}८० ]</noinclude>
39vzapf5p2n878kwjz5szg3q0fs1223
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९४
104
110480
230514
2026-05-30T09:21:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230514
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''मथुरा.'''}}</noinclude>देवकी, बालकृष्ण, कंस, नंद, यशोदा व बलराम वगैरे कृष्णाचीं सख्खी व दत्तक वडील माणसे यांची चित्रे दाखविण्यांत आलीं तीं चित्रे पाहून आम्हांला भक्तीचा उमाळा येण्याऐवजी दुसराच कसलातरी उमाळा आला. आपल्या इकडे शिराळशेटाच्या सणाच्या दिवशी किंवा नागपंचमीचे दिवशी जशी ओबडधोबड, अगडबंब, कुरूप व ओंगळ मातीची चित्रे करतात, तशाच तऱ्हेच्या त्या मूर्ति पाहून आशाभंग व हास्य असे मिश्र मनोविकार एकसमयावच्छेदकरून मनांत उद्भूत झाले. मथुरा पाहण्यास यावयाचा बेत केल्यापासून या ठिकाणच्या पुरातनपणाबद्दल व तेथल्या कृष्णाच्या आयुष्याबद्दल बऱ्याच सामक्षा आपल्याला दृग्गोचर होतील म्हणून मोठ्या औत्सुक्याने या यात्रेला आलों. परंतु आतांचा हा देखावा पाहून आमच्या मनांतील ते औत्सुक्य पार नाहींसे झाले. व आमच्या लोकांच्या अंधश्रद्धेबद्दल व मूर्ख भोळसटपणाबद्दल हंसूं येऊ लागलें. आतांपर्यंत पाहिलेल्या सर्व देखाव्यांवरून आमची अशी खातरी झाली, कीं, मथुरा कृष्णाचें खरें जन्मस्थान असो वा नसो, त्याच्या गोष्टी खऱ्या असोत वा नसोत, परंतु हल्लीं जीं कृष्णचरित्रांतील स्थळें म्हणून दाखवितात तीं स्थळें कृष्णाच्या गोष्टीनंतर भाविक लोकांना फसविण्याकरितां तयार केलेली आहेत व असल्या स्थळांबद्दल, येथल्या चित्रांबद्दल व मूर्तीबद्दल मनुष्याच्या मनांत आदर तरी कसा उत्पन्न होतो, याचेंच आम्हांला गूढ पडलें. परंतु ती वेळ पंड्याजवळ वादविवाद करण्याची नव्हती. या सर्व मूर्तीजवळ एक बुवा बसला होता व तो आम्हांला पिवळ्या मातीचा अंश प्रसाद म्हणून देत होता. आम्हीं पंड्याच्या मर्जीखातर या सर्व विद्रूप चित्रांपुढे एक दोन आण्यांचे पैसे ठेवून तेथून पाय काढला.
{{gap}}पुढें आम्हांला कंसाचा वाडा व किल्ला म्हणून मोडक्यातोडक्या तटांनी व्यापृत असे एक आवार दाखविण्यांत आलें. तें जुनाट दिसत होते. परंतु ३००० वर्षापूर्वीचें असेल असें भासत नव्हते. परंतु या सर्व ठिकाणच्या अर्वाचीनत्वाबद्दल एकदां मनांत जाणीव उत्पन्न झाल्यावर या असल्या भाविक लोकांना फसविण्याकरितां ठरविलेल्या जागा व<noinclude>{{right|[ ८१ }}</noinclude>
4h7zs9790r9i0nc3y1jpw1jhy7reeim
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९५
104
110481
230515
2026-05-30T09:24:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230515
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>ठिकाणे पाहण्याची आमची हौस जागच्याजागींच जिरली व आम्हीं पंड्यास, आम्हांला आतां जुनीपुराणीं देवळें नकोत, येथलीं उत्तम नवीं देवळें दाखवा, म्हणून सांगितलें. तेव्हां त्यानें आम्हांला गांवाकडे नेलें व आम्हीं तेथें बरींच देवळें पाहिली. त्यानें मात्र आमचें मन प्रसन्न केलें. कारण मथुरेतील देवळें फार सुंदर आहेत. या देवळांतील दगडाचें नक्षीकाम, जाळीदार खिडक्या, कोरीव खांब व देवळांचे एकंदर अंतरंग फारच सुबक आहे, यांत शंका नाहीं. एकेक देऊळ पहावें तो मागच्यावर ताण; परंतु मथुरेतील देवळें अगदी दाट वस्तीत व भर बाजारांत बांधलेली असल्यामुळे व त्यांच्या सभोवार खुली जागा फारच कमी असल्यामुळे ह्रीं देवळें प्रथमतः मनांत भरत नाहींत. पहिल्या पायऱ्या चढतांना आपण एखाद्या सुंदर आणि फारच विस्तीर्ण व सुबक देवळांत शिरत आहोंत असें वाटत सुद्धां नाहीं. परंतु आंत गेल्यावर देवळाचे काम पाहून तेथल्या कारागिरीबद्दल मनुष्य आश्चर्यानं तोंडांत बोटेंच घालतो, मात्र या सर्व देवळांत फारशी जुनीं देवळें मुळींच दिसत नाहींत. बहुतेक सर्व देवळें अलीकडील तीन चारशे वर्षांतील आहेत. हें असें कां? याचा उलगडा या पुस्तकाच्या शेवटल्या भागावरून होईल.
{{gap}}याप्रमाणे मथुरेतील बहुतेक पाहण्यासारख्या ठिकाणांचें दर्शन घेऊन तीन चार तासांनी आम्ही आपल्या बिऱ्हाडाला आलो व मग नित्याप्रमाणे आमच्या अर्वाचीन स्थालीची आराधना करून पाकनिष्पत्ति केली व भोजनोत्तर संध्याकाळपर्यंत विश्रांति घेतली.
{{gap}}वर लिहिल्याप्रमाणे मथुरेच्या प्रथम दर्शनानें जरी आमची थोडीशी निराशा झाली, पण पुढे देवळांच्या दर्शनाने ती नाहींशी होऊन आनंद वाटला. तरी जी गोष्ट हरिद्वारला शक्य नव्हती, ती येथे शक्य झाल्यामुळें माझें मन अधिक आनंदित झालें हरिद्वारच्या नजिकच्या गंगाप्रवाहांत बोटींतून सहल करून सर्व शहराची शोभा पाहण्याची किती वेळां तरी इच्छा झाली असेल; परंतु इच्छेनें जर होड्या तयार होत्या तर आमची इच्छा तृप्त झाली असती! परंतु ती गोष्ट शक्य कोटींतील नसल्यामुळें मनींची इच्छा मनांत दाबावी लागली. परंतु मथुरेस ज्या<noinclude>
{{gap}}८२ ]</noinclude>
jp1ia2z77xfeow19j8zg0dd1iddykok
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९६
104
110482
230516
2026-05-30T09:28:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230516
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''मथुरा.'''}}</noinclude>बिऱ्हाडीं आम्हीं उतरलो होतों त्याच्या समोरचे घाटाजवळ पुष्कळ नावा दिसल्या व त्या पाहून आह्माला आनंद झाला व येथे असेतोपर्यंत रोज सायंकाळी नावेत बसून सहल करावयास जावयाचें असा आम्ही बेत केला. तदनुरूप सायंकाळ होतांच आम्ही एका नाववाल्यास बोलावून आह्मांला सर्व नदीभर सहल करण्यास घेऊन जाण्यास फर्माविलें. माणशी दोन पैसे आह्माला स्वत्तच वाटले. नावेंतून शहराचा देखावा फारच मनोहर दिसतो. गांवाच्या एका बाजूला तो रेलवेचा लांबच लांब पूल, दुसऱ्या बाजूला तो कंसाचा किल्ला; समोर सर्व शहरांतील घाटांची रांगची रांग, त्या मांगें घरांच्या ओळीच्या ओळी, देवळांची शिखरेंच शिखर व मागच्या बाजूला एक काळसर मृत्तिकामय वाळवंटचे वाळवंट, हा देखावा चित्ताकर्षक आहे यांत संशय नाहीं. काशीमध्यें नावेंत बसून सर्व शहर पाहिले म्हणजे असाच सुंदर देखावा दिसतो. मात्र काशीस गंगेचें पात्र फारच प्रचंड आहे व प्रवाह खोल असून शीघ्रगामी आहे. यमुनेचे पात्र त्या मानाने लहान आहे व यमुनेचा प्रवाहही लहान असून मंदगति आहे. परंतु दोन्ही शहरांची रचना अगदीं सारखीच आहे. यामुळे यमुनेंतून नावेंत बसून कंसाच्या किल्यापासून रेलवे पुलापर्यंत वल्हवीत गेले म्हणजे आपण छोटेखानी काशीच पहात आहों कीं काय, असा भास होतो. जरी आम्हीं पाहिली त्या वेळीं यमुना नदी आपल्या वर्षाकाळांतील पूर्ण ऐश्वर्यात नव्हती, उलट उन्हाळ्यामुळे तिला कांहींसें जलदुर्भिक्ष आलेलें होतें, व वाळूची मैदानें उघडी पडलीं होतीं, तरी सुद्धां यमुना नदी तिच्या पाण्याच्या रंगामुळे गंभीर व भव्य दिसली. नावेंतून सायंकाळीं नदींतून जात असतांना निरनिराळ्या घाटांची व त्यावरील देवळांची शोभा अवर्णनीय दिसते. मथुरेतील सर्वात प्रेक्षणीय व पवित्र घाट ह्मणजे विश्रामघाट होय. हा शहराच्या बहुतेक मधोमध आहे. कंसाला मारल्यावर कृष्णाने याच घाटावर विश्रांति घेतली, अशी दंतकथा आहे. ह्मणूनच या घाटाला विश्रामघाट असें म्हणतात. सात साडेसातांच्या सुमारास या घाटावर आरती होते. तीं दीपावलीचीं पाण्यांत पडलेलीं प्रतिबिंबें, तो मंजुळ घंटानाद व ते भाविकांचे सुस्वर आलाप, वगैरे<noinclude>{{right|[ ८३ }}</noinclude>
2epe1m1v3pqddh7mlpcfw2o014c60hw
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९७
104
110483
230517
2026-05-30T09:33:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230517
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>प्रकार पाहून व ऐकून मनाला फार आनंद होतो व नदीच्या पात्रांतून बाहेर येऊच नये, असे वाटते; परंतु नावाडी उशीर झाल्यामुळे परतण्याची घाई करतो. नाइलाज म्हणून त्याच्या म्हणण्याला रुकार देऊन परत आपल्या बिऱ्हाडी यावे लागतें. आह्मीं मथुरेस तीन दिवसच होतो. परंतु या तीन्ही दिवशी सायंकाळीं आम्हीं नावेंतून सहल करावयास जात असूं.
{{gap}}दुसरे दिवशीं सकाळीं वृंदावनास जावयाचें असल्यामुळे आम्हीं लवकरच उठलों व आदल्या दिवसाप्रमाणें दोन घोड्याच्या गाड्या आणवून पंड्यास बरोबर घेऊन वृंदावनास गेलों. वाटेने जातां जातां छोट्या छोट्या बागा व बंगलेवजा लहान लहान घरे लागतात. केव्हां यमुना नदी रस्त्याच्या अगदी नजिक येते तर केव्हां दूर जाते. इकडील प्रदेश सपाटीचाच आहे. डोंगर किंवा उंचवटा फारसा दृग्गोचर होत नाहीं. अशी संभोवतालची शोभा पहात पहात सुमारें तासा दीड तासाने आम्हीं वृंदावनास येऊन पोहोंचलों. या गांवाला मथुरेपेक्षांही देवळें जास्त आहेत. सर्व देवळें अर्थात् कृष्णाचीच आहेत. परंतु त्यांना कृष्णाच्या निरनिराळ्या नांवावरून राधारमण, मदनमोहन, राधावल्लभ, राधागोपाळ, रंगजी, गोविंदजी, गोविंद-देव, गोपीनाथ, द्वारकाधीश वगैरे नांवें आहेत; किंवा बांधणारांच्या नांवावरून तरी तीं पडलेली आहेत. जसें 'लालबाबुका देवल,' 'शेटसाहेबका देवल,' 'ग्वालेर महाराजका देवल' 'राणी निकारीका देवल' पंड्याने आम्हांला सांगितलें कीं, येथे हजारों देवळें आहेत. तेव्हां सगळी देवळें पाहणें अशक्यच होते. तरी जीं प्रख्यात देवळें आहेत तेवढीं आम्हांला दाखीव असे आम्हीं त्याला सांगितलें, त्याने आम्हांस सरासरी दहा बारा देवळें दाखविलीं तीं खरोखरीच सुंदर, भव्य व हिंदु शिल्पकलेची साक्ष पटविणारीं आहेत. या देवळांपैकीं पुष्कळशी बंगाली बाबूंनी बांधलेलीं आहेत, याचें प्रथमतः आह्मांला मोठें गूढ वाटले; परंतु बंगाल्यांत चैतन्य म्हणून जो साधु झाला, त्यानें राधाकृष्णाच्या भक्तिपंथाचा बंगाल्यांत प्रसार केला व तो वृंदावनांत शेवटीं येऊन राहिला होता. यामुळें बंगाल्यांतील भाविक लोकांनी येथे कृष्णाचीं फारच सुंदर देवालये बांधलीं आहेत. म्हणूनच वंगश्री वृंदावनांत येऊन राहिली आहे, अशी येथें ह्मण<noinclude>
{{gap}}८४ ]</noinclude>
8g8gn1czmo3fqbze0uz0tzsapis4cgf
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९८
104
110484
230518
2026-05-30T09:37:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230518
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''वृंदावन.'''}}</noinclude>पडली आहे. वृंदावनांतील जी देवळे आम्ही पाहिलीं त्यांच्या सभोंवती खुली जागा बरीच असल्यामुळे तीं मथुरेच्या देवळांपेक्षां जास्त उठावांत दिसतात. बाकी कलाकौशल्याच्या दृष्टीने मथुरंतील देवळें कांहीं कमी नाहींत. पण तीं भर बाजारांत व संकुचित जागेत असल्यामुळे त्यांची शोभा कमी होते यांत शंका नाहीं. येथील देवळांना उत्पन्न दांडगीं आहेत व भाविक लोकांकडून देणगीच्या रूपानेंही दरसाल फार मोठी रक्कम मिळते. वीसवीस हजार रुपयांच्यावर वार्षिक मिळकत असणारी देवळें येथें पुष्कळ आहेत. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची श्रीमंत देवळें व देव फारसे नसल्यामुळे. प्रथमतः इकडल्या देवळांचा थाट पाहून आम्ही अगदीं थक्क होऊन गेलों. कृष्ण हा देव विलासी असल्यामुळे त्या देवाचीं देवळेंही एकाद्या राजविलासी राजाच्या राजवाड्याप्रमाणे, किंवा अंतःपुराप्रमाणे शृंगारलेली असावीं, हें स्वाभाविक आहे. तरी पण येथल्या देवांच्या एकंदर पूजाअर्चांबद्दलच्या हकीगती पाहून व ऐकून आम्हांला लोकांच्या भाविकपणाचे हसूच आले. येथल्या बहुतेक देवांची एकाद्या विलासी राजाप्रमाणे रात्रंदिवस तरतुद केली जाते. येथील देवांचे मनुष्याप्रमाणेंच सर्व आहार-विहारादि व्यवहार चालतात. आधीं देवळाच्या गाभाऱ्यात सर्व सुखसोई व विलासांचे प्रकार असतात. प्रत्येक देवाच्या मूर्तीवर सुंदर पंखा असतो. तिकडे उन्हाळा फार असल्यामुळे देवालाही ऊष्मा भासत असावा. या पंख्याची एक दोरी गाभाऱ्याबाहेर देवदर्शनाला येणाऱ्या भक्ताच्या उभे राहण्याच्या ठिकाणापर्यंत आणलेली असते व प्रत्येक भक्तानें दोरी दोन चार वेळ तरी हालवून देवाला वारा घालून त्याची सेवा करण्याचा परिपाठ आहे. देवळासमोर बहुधा गार पाण्याचे सुंदर कारंजें असावयाचेंच, व कारंज्यांतून उडणारे जलतुषार मूर्तीपर्यंत जावेत, अशी योजना केलेली असते. येथे देवाच्या गाभाऱ्याला सुवासिक फुलांच्या माळा घालण्याचा फारच प्रघात दिसला. यामुळे देवळांत गाभाऱ्याजवळ गेलें, कीं, त्या फुलांच्या माळांच्या सुवासानें, त्या मनोहर कारंजाच्या फवाऱ्याने, चंदनाच्या उटीच्या वासानें भक्ताचें मन गारीगार होते, यांत शंका नाहीं. येथल्या देवाचे सर्व सुखसोहाळे दररोज व विशेषतः गिरनिराळ्या सणाच्या वेळी<noinclude>{{right|[ ८५ }}</noinclude>
ln0kaoxgehj5d4sqkl6clpaz47nvqb8
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/९९
104
110485
230519
2026-05-30T09:40:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230519
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>करण्याची रीत आहे. रोज देवाचें न्हाणे व्हावयाचें, पुढे त्याचा पोषाख व्हावयाचा; नंतर त्याचे जेवणखाण व्हावयाचे; पुढें वामकुक्षी व्हावयाची; पुनः मधल्या वेळचें खाणें सायंकाळीं फिरणें; पुढे रात्रीचे जेवण व तदनंतर निद्रा वगैरे सर्व व्यवहार देवाचे होतात. यामुळे येथे गाभाऱ्यांना पडद्याची सोयही केलेली असते. देवाला निजण्याची इच्छा झाली, कीं, सर्व बाजूचे पडदे टाकून काळोख केला म्हणजे दिवसांसुद्धां झोप घेण्यास हरकत नाहीं! यामुळे या गांवांत सर्व देवांचें दर्शन होणे कठीण जातें. आम्ही एका देवळांत गेलो तेथे आम्हांला समजलें, कीं, देव निद्रा घेत आहेत व अर्धा तास देवाचें दर्शन किंवा भेट होणार नाहीं! त्या देवळांत तमाम लोक उभे! कारण, त्यांना देवाचें दर्शन घेण्याची इच्छा. परंतु आम्ही इतका वेळ तेथे उभे रहावें किंवा नाहीं हा आम्हांला विचार पडला. आम्हांला तर तिष्ठत बसण्यास सवड नव्हती. तेव्हां आम्हीं मनांत म्हटलें, कीं, "येथले देव निजतात! तर ते वेळींच उठतीलसा काय नेम! तेव्हां ज्याप्रमाणें अर्वाचीन काळी एकादे गृहस्थ घरी भेटले नाहींत, तर आपण आपल्या नांवाची कार्ड ठेवून जातों, त्याप्रमाणेंच आपण करावें." असें मनांत म्हणून आम्हीं नमस्काररूपी आमच्या नांवाची कार्ड देवाजवळ ठेवून दुसरें देऊळ पहावयास गेलों. दुसऱ्या देवळांत गेलों तो तेथेही देव भोग भोगीत आहे असें समजलें! पुनः आम्हांला पंचाईत येऊन पडली. परंतु आमच्या सुदैवाने देवाचें भोग भोगणे संपलें व पडदा एकीकडे झाला व आम्हांला देवाचें दर्शन घडलें. तिसऱ्या एका देवळांत गेलों तेथें देवळाच्या प्रशस्त आवारांत पालखींत बसून देव फिरावयास निघाले आहेत, असें आमच्या दृष्टीस पडलें! याप्रमाणें वृंदावनांतील देवळांत आमच्या हिंदुसमाजांतील एका धार्मिक पंथाच्या अंधश्रद्धेबद्दलचे बरेच मासले दोन तीन तासांच्या अवधींत पाहण्यास सांपडले.
{{gap}}येथे सर्वात प्रचंड भव्य व शिल्पकलेच्या दृष्टीने पहिल्या प्रतीचें देऊळ म्हणजे रंगजीचें देऊळ होय. हे देऊळ येथील शेठ गोविंददास व राधाकृष्ण यांनी रंगाचार्य नांवाच्या आपल्या गुरूच्या सांगण्यावरून बांधलेले आहे. याला एकंदर ४५ लाख रुपये खर्च झालेला आहे. याचा<noinclude>
{{gap}}८६ ]</noinclude>
j3h4csuzaqqgd9x1zlmbbbyleei19iz
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१००
104
110486
230520
2026-05-30T09:44:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230520
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''वृंदावन.'''}}</noinclude>बाह्य प्राकार फार विस्तीर्ण असून प्रचंड आहे. हे देऊळ मद्रासी पद्धतीवर बांधलेले असल्यामुळे दरवाज्यावर उंच गोपुरें आहेत. ह्रीं गोपुरें प्रथमतः दृष्टीस पडली, तेव्हां आम्हांलाही आश्चर्य वाटले. परंतु तेथले मद्रासी पोषाखाचे पुजारी पाहून व देवळाच्या उत्पत्तीची वरील हकीकत ऐकून आमचें आश्चर्य कमी झाले. या देवळाच्या आवाराचें पश्चिम प्रवेशद्वार ९३ फूट उंच असून तें मथुरेच्या धर्तीवर आहे. हें महाद्वार फार भव्य दिसतें. यामुळे आंत जातांना देवळाच्या प्रचंडतेची साक्ष पटते. देवळाचें काम व एकंदर देखावा फारच प्रेक्षणीय आहे. देवळाच्या समोर एक सोन्याचा ध्वजस्तंभ आहे. येथलीं दुसरीं चांगलीं प्रेक्षणीय देवळें म्हणजे लालाबाबूचें देऊळ. याचेंही काम फारच सुबक आहे. मदनमोहन व गोपीनाथ ह्रीं देवळेंही चांगलीं आहेत. राधारमणाचें देऊळ अर्वाचीन आहे. तें सर्व संगमरवरी दगडाचें आहे. त्याच्या सभामंडपाचे खांब पीळ दिलेल्या दोरखंडाप्रमाणें केलेले असून एक एक खांब एका एका संबंध संगमरवरी दगडाचा आहे. हें देऊळ पाहून दागदागिन्यांनी भरगच्च भरलेल्या श्रीमंत बाईची आम्हांला आठवण झाली. दागिन्यांच्या अतिरिक्त हौसेने ज्याप्रमाणे केव्हां केव्हां सौंदर्यहानि होते, तसेंच या देवळाचें झालेले आहे. या लहानशा देवळाला दहा लाख रुपये खर्च झालेला आहे. यापेक्षां राधाइन्द्रकिशोर हे देऊळ जास्त साधें, पण अधिक सुंदर दिसतें. गिरिधारीदास या नांवाच्या आपल्या गुरूच्या देखरेखीखालीं बांधलेलें ग्वालेरच्या महाराजांचें राधागोपाळाचें देऊळही प्रेक्षणीय आहे. या देवळाला सुमारें चार पांच लाख रुपये लागलेले आहेत.
{{gap}}इतकी देवळें पाहणें झाल्यावर आम्ही आपल्या घड्याळांत पाहिलें तों फारच उशीर झाला असे दिसलें व भुकेनेंही आपल्याकडे आमचें लक्ष्य वेधले, तेव्हां 'आधी पोटोबा मग विठोबा' या म्हणीप्रमाणें आम्हीं वर्तन करण्याचे ठरवून गाडीत बसून परत आमच्या बिऱ्हाडाला येऊन पोंचलों; भोजनादि विधि उरकले व आदल्या दिवसाप्रमाणें सायंकाळपर्यंत करमणुकींत व विश्रांतींत वेळ घालवून सायंकाळी नौकेत बसून सहल करावयास गेलों.{{nop}}<noinclude>{{right|[ ८७ }}</noinclude>
993y7ty7k18ylk5ftt31n36pthowfqh
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०१
104
110487
230521
2026-05-30T09:49:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230521
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>{{gap}}तिसरे दिवशीं सकाळीं आम्हीं जमनाभाग पहावयास गेलों. तेथील एका प्रसिद्ध व्यापाऱ्याचें हें रहाण्याचे ठिकाण आहे. हे मथुरेच्या दक्षिणेस रेलवे पुलाच्या पलीकडे परंतु यमुनेच्या कांठींच आहे. आम्ही गेलों ते दिवस भर उन्हाळ्याचे असल्यामुळे यमुनेला पाणी फार कमी झाले होतें, व तिला मधून मधून खांडवे पडले होते. यामुळें नावेंतून जाण्यास सवड नव्हती. बाकी इतर ऋतूंत या बागेस नावेंतून जातां येतें व तसें गेले म्हणजे शहराची शोभा पहात पहात जातां येतें, असें आम्हांला सांगण्यांत आलें. परंतु सध्यां तें शक्य नसल्यामुळे आम्हांला गाडी करूनच जाणें भाग पडलें. आवारांत शिरण्याचा दरवाजा भव्य असून प्रेक्षणीय आहे. दरवाजापासून थोड्या अंतरावर एक कारंजे आहे व कारंजांतील पाणी लांबचलांब पाट बांधून त्यांतून बागेला जाण्याची तजवीज केली आहे. बाग बरीच विस्तीर्ण आहे, व तीत मोठमोठे वृक्ष पुष्कळ आहेत. झाडांच्या फांद्या वळवून केलेले वृक्षमडपही दोन तीन आहेत. यंदां आपल्या इकडील आंब्यांचे पीक फारच कमी होते; परंतु या बागेतील सर्व आंबे फलभारानें नम्र झालेले पाहून आम्हांला आनंद झाला. बागेच्या मध्यभागी बंगलेवजा शेटसाहेबांची कोठी अगर राहते घर आहे. त्यांत एक चांगला शृंगारलेला दिवाणखाना असून त्यामध्ये या घराण्यांतील दोनचार पुरुषांच्या तसबिरी आहेत. बंगल्या शेजारींच व नदीच्या अगदी कांठीं एक लहानसे देऊळ व एक छत्री आहे. या दोन्ही इमारती दगडाच्या असून त्यांचें काम सुबक आहे. एकंदर ठिकाणची रचना व व्यवस्था पाहून आम्हांला मालकाच्या अभिरुचीचें कौतुक वाटलें.
{{gap}}आमच्या मथुरावासाचा हा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी आमच्यापैकीं कांहीं मंडळी दोनप्रहरच्या गाडीनें मुरादाबादेस जावयाची होती, व बाकीचे आम्हीं परत देशी येण्याकरितां रात्रीच्या गाडीनें निघणार होतों. यामुळे लवकरच जेवणें आटपून आम्हीं स्टेशनवर गेलों व परत आल्यावर आम्हीं दिवसाउजेडींच जेवणखाण करून सामानाची बांधाबांध करून मथुरेचे शेवटचे दर्शन घेण्याकरितां बाहेर पडलों मथुरेचे पेढें फार प्रसिद्ध, म्हणून बाजारांत जाऊन पेढे घेतले. हे पेढे कांहीं तरी<noinclude>
{{gap}}८८ ]</noinclude>
oxl7zo606b074wc0zguj1hhz34ihn2g
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०२
104
110488
230522
2026-05-30T09:58:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230522
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''मथुरा.'''}}</noinclude>विशेष प्रकारचे असतील, अशी आमची कल्पना होती. परंतु आमची निराशा झाली. पण या पेढ्यांचा मुख्य गुण म्हणजे त्यांचा विलक्षण टिकाऊपणा होय, असें आम्हांला सांगण्यांत आलें. नंतर आम्हीं विश्रामघाटावर आलों व तेथे क्षणभर विसावा घेतला. सायंकाळी तेथे एक मौज दिसते. घाटावरील यात्रेकरू पीठ किंवा दुसरें कांहीं खाद्य यमुनेंत टाकतात व ते खाण्याकरितां तेथें कांसवें जमतात. इतक्या कांसवांचा तांडा आम्ही आजन्म पाहिला नव्हता. यांतील पुष्कळ कांसवें बरींच मोठी होती. या ठिकाणी माकडेही फार आहेत. हीं माकडे सुद्धां येथें या वेळी येतात. एका माकडानें तर एका कांसवाच्या पाठीवर उडी मारून त्यावर पडलेलें खाद्य पटकन् मटकावून टाकले व न घाबरतां त्या कांसवाच्या पाठीवर ते मोठ्या ऐटीनें बसलें! हा देखावा पाहून आम्हांला फारच मौज वाटली. ही जशी कांसवांची येथें मौज पहावयास सांपडते, तशीच सायंकाळी हरिद्वारास माशांची मौज पहावयास सांपडते. यात्रेकरू भाविक लोक, दररोज सायंकाळीं पीठ विकत घेऊन त्याच्या लहान लहान गोळ्या करून गंगेत फेंकतात व माशांच्या झुंडीच्याझुंडी प्रवाहाच्या अगदीं कडेला येतात. ही मौज आम्हीं हरिद्वारास पाहिली, त्याची आतां आम्हांला आठवण झाली.
{{gap}}झाले. येथे मथुरा वृंदावनाचें दृष्टिगम्य वर्णन संपले. परंतु मथुरा हे शहर फार जुने आहे; यानें किती तरी राजकीय आणि धार्मिक स्थित्यंतरें पाहिलीं आहेत. तसेंच हल्ली तरी तें शहर कृष्णभक्तीचें व वैष्णवपंथाचं आद्यस्थान आहे. तरी आतां मधुरेच्या कृष्णभक्तीच्या व वैष्णवपंथाच्या श्रुतिगम्य भागाकडे वळू.{{nop}}<noinclude>{{right|[ ८९ }}</noinclude>
br6fgyhg8r31lbarfsjh6xclyz29odd
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०३
104
110489
230524
2026-05-30T10:05:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230524
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{Css image crop
|Image = माझा_उत्तरहिंदुस्तानचा_प्रवास.pdf
|Page = 103
|bSize = 498
|cWidth = 383
|cHeight = 80
|oTop = 29
|oLeft = 57
|Location = center
|Description =

{{x-larger|{{center|'''{{bar|1}}६{{bar|1}}
कृष्णकथा व वैष्णवपंथ.'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}मागल्या लेखांत मथुरेतील प्रेक्षणीय स्थळांचे वर्णन दिलें. दोनचार दिवस येथे येणारास व वरवर पाहणारास मथुरेची हल्लींची वस्ती, मथुरेंतील देवळें, व इतर प्रेक्षणीय स्थळें जरी अर्वाचीन दिसली- व तीं तशी आहेत- तरी पण पुराणवस्तुसंशोधकांच्या दृष्टीनें मथुरेचें फारच महत्त्व आहे. कारण येथेंच कित्येक फार जुनी जुनी नाणीं सांपडलेलीं आहेत. येथेंच खुद्द बुद्धाच्या वेळच्या वस्तु व मूर्ति सांपडलेल्या आहेत, आणि मथुरेत सांपडलेल्या शिलालेखांनी व नाण्यांनी हिंदुस्थानांतील पुरातन इतिहासांतील कांहीं कांहीं दुवे जुळवून आणलेले आहेत. शिवाय फार प्राचीनकाळी आलेले चिनी प्रवासी फेहेअन व ह्यूएनसंग हे दोघेही या शहरीं येऊन बरेच दिवस तेथे राहिले होते. व त्यांनी या शहराचे आपल्या ग्रंथांत वर्णन करून ठेवलेले आहे. यावरून मथुरा हे शहर जरी हिंदुस्थानांतल्या अत्यंत प्राचीन शहरांपैकीं नसले, तरी त्याचा पुराणत्वांत दुसरा नंबर लागेल, यांत शंका नाहीं. या शहराचा दुसरा एक विशेष हा आहे कीं, काशी व गया या क्षेत्रांप्रमाणेच हिंदुधर्माच्या लोकांना हें जितकें पवित्र स्थान वाटतें, तितकेंच तें बुद्ध धर्माच्या लोकांनाही पवित्र वाटतें. कारण, स्वतः बुद्ध या नगरीत पुष्कळ दिवस राहिले होते, असा दाखला सांपडतो. ऐतिहासिक काळाच्या मागे जाऊन जर पुराणांकडे पाहिलें तर मात्र एक चमत्काराची गोष्ट दृष्टोत्पत्तीस येते. ती<noinclude>
{{gap}} ९० ]</noinclude>
jovddjzcp7kek9udak3gvgiwzby7l36
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०४
104
110490
230525
2026-05-30T10:21:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230525
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कृष्णकथा.'''}}</noinclude>अशी कीं, मथुरा व त्याच्याशी संलग्न अशी कृष्णकथा याचा मागमूसही महाभारतांत लागत नाहीं. पण मथुरा स्थापनेची कथा रामायणांत मात्र सांपडते.
{{gap}}यमुनेच्या कांठी 'मधुवन' म्हणून एक मोठें वन होतें व त्या वनांत 'मधुराक्षस' राहत असे. त्यानें शंकराला प्रसन्न करून एक यशस्वी शूल मिळविला होता. त्याच्या पश्चात् तो लवण नांवाच्या मधुराक्षसाच्या मुलाच्या ताब्यांत आला. हा लवण राक्षस यमुनातीरवासी तपस्व्यांना फार त्रास देऊं लागला, म्हणून ते श्रीरामचन्द्राकडे अयोध्येस दाद मागण्याकरितां गेले. रामानें शत्रुघ्नास लवणाचे पारिपत्य करण्यास व तेथें राज्य स्थापन करण्यास धाडलें. त्याप्रमाणें शत्रुघ्न तेथे आला व लवणास शूलाखेरीज गांठून त्याने त्याचा वध केला, व सर्व मधुवन तोडून टाकून यमुनेच्या कांठीं मधुपुर, मधुरा किंवा मथुरा म्हणून शहर बसविलें. तेथेंच त्यानें राज्य स्थापन केलें व बारा वर्षानंतर तो अयोध्येस रामास भेटावयास गेला. कालिदासानें रघुवंशांत इंदुमतीच्या स्वयंवराच्या सहाव्या अध्यायांत ज्याची राजधानी मथुरा यमुनाकांठीं आहे, असा शूरसेनाधिपति सुषेण याला स्वयंवरसभेत राजांच्या मालिकेत आणिलें आहे, व त्याच्या वैभवाचें व यमुनानदीच्या प्रदेशाच्या सौंदर्याचें वर्णन केले आहे. रामायणांतील वरील गोष्टीचा व कालिदासानें दिलेल्या वरील गोष्टीचा मेळ बसत नाहीं. पण कालिदासाच्या कविवर्णनास इतकें महत्त्व देतां येत नाहीं.
{{gap}}इतके खास कीं, बुद्धाच्या वेळीं हे शहर फारच भरभराटीत होतें; व त्याच्या काळापासूनच तेथें बुद्धधर्माचें प्राबल्य झाले व ते सुमारें सन ७०० वर्षेपर्यंत कायम राहिलें. ख्रिस्ती शकाच्या सुमारें ५०० व्या वर्षी फेहेअन हा चिनी प्रवासी मथुरेस आला होता; तेथपर्यंत मथुरेस बुद्धधर्म बराच जोरांत होता. परंतु सन ४०० पासून ७४० पर्यंत त्याचा पूर्ण बीमोड झाला व मथुरा पुनः हिंदुलोकांचें पवित्र स्थान होऊं लागली.
{{gap}}मथुरेतील सर्वात जुन्या इमारती म्हणजे बुद्धधर्मीयांचा एक विहार व एक स्तूप या आहेत. या स्तूपांत बुद्धाचीं नखें होतीं. उपगुप्त या नांवाच्या<noinclude>{{right|[ ९१ }}</noinclude>
ix2sua20rpybce4682rnujoxxarjryo
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०५
104
110491
230526
2026-05-30T10:28:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230526
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>मथुरेच्या राहणाऱ्या अत्यंत पूज्य अशा बुद्धभिक्षूनें हा विहार बांधला व त्यानेच अशोक मौर्याला बुद्धधर्माची दीक्षा दिली. याप्रमाणें मौर्य राजांच्या काळी मथुरा ही फार प्रख्यात नगरी होती. असें दिसतें. बुद्धधर्माचा प्रसार कर्ता अशोक हा बहुधा इसवी शकापूर्वी २३२ च्या सुमारास निवर्तलेला असावा. अशोकानंतर मौर्यवंश आणखी शंभरदीडशे वर्षे चालला. परंतु बृहद्रथ मौर्याचा सेनापति पुष्पमित्र यानें मगधदेशाचे राज्य बळकावलें. इसवी सनापूर्वी १८४ या वर्षापासून संग वंश राज्यपदारूढ झाला. तेव्हां मथुराप्रांत व हें शहर संगवंशाच्या ताब्यांत गेलें. इकडे काबूल व पंजाब येथे ग्रीक राजे राज्य करीत होते. त्यांपैकी मिलिंद किंवा ग्रीक भाषेत ज्याला मीनांडर म्हणतात हा फार पराक्रमी निघाला. त्यानें बुद्धधर्माचा स्वीकार केला होता, असें दिसतें. कारण 'मिलिंदाचे प्रश्न' या नांवाचा बुद्धधर्मातील एक प्रख्यात ग्रंथ आहे. या मिलिंदानें हिंदुस्थानावर स्वारी करून काठेवाड व मथुराप्रांत काबीज केले व तो यमुनाकाठच्या मथुरेत राहिला होता, असा दाखला सांपडतो. तेव्हांपासून मथुरेच्या आसपासचा मुलूख व तें शहर ग्रीक राजांच्या ताब्यांत गेलें व मथुरेस त्यांच्या वतीनें सेट्रप किंवा क्षत्रप राज्य करूं लागले. हे क्षत्रप पुढे पुढे स्वतंत्र राजे बनले असावे. क्षत्रपांपैकी सोदास याची थोडीशी माहिती मिळते. हा रजुबलाचा पुत्र होता. हा इसवी सनापूर्वी ७२ च्या सुमारास क्षत्रप झाला. मथुरेंत याच्या नांवाचा व याच्या काळचा एक शिलालेख सांपडलेला आहे. पुढील वर्षासंबंधी कांहीं माहिती मिळत नाहीं. परंतु काबूल, काश्मीर व पंजाब येथील हिंदुग्रीक राज्य नाहींसें होऊन तेथे दुसऱ्या राष्ट्राचें राज्य झालें, व त्यामध्यें कुशन घराण्यास वर्चस्व आलें. या घराण्यांतील राजांनी प्रचंड राज्य स्थापून हिंदुस्थानाकडे आपला मोर्चा फिरविला, व उत्तरेकडील बराच भाग आपल्या ताब्यांत आणला. या घराण्यांपैकी कनिष्क राजाची दिगंत कीर्ति झाली. याने सुमारें पंचेचाळीस वर्षे राज्य केलें. याच्या वेळचीं नाणीं मथुरेस व उत्तर हिंदुस्थानांत अतोनात सांपडली आहेत, व त्या नाण्यांवरून त्याच्या राज्याचा विस्तार व वाढ यांची कल्पना होते. तसेंच कनिष्काची राज-<noinclude>
{{gap}} ९२ ]</noinclude>
jutk5sbeue4uhdt334cpgqmqa04ljf0
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०६
104
110492
230527
2026-05-30T10:33:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230527
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कृष्णकथा.'''}}</noinclude>धानी पुरुषपुर- अर्वाचीन पेशावर- ही होती. परंतु त्यानें खुद्द पाटलीपुत्रावर हल्ला केला. याच्या पहिल्या पहिल्या नाण्यांत ग्रीक देवता व विशेषतः सूर्य व चंद्र यांची चित्रे आहेत, व भाषा ग्रीक आहे. पुढील नाण्यामध्यें ग्रीक अक्षरें मात्र आहेत. भाषा परशियन आहे. ग्रीक, हिंदु व परशियन देवतांच्या मूर्ति आहेत. शेवटच्या नाण्यांवर बुद्ध शाक्यमुनीची मूर्ति आहे. यावरून कनिष्कानें शेवटीं बुद्ध धर्म स्वीकारला होता असें दिसतें. कनिष्कानें इसवी सन ७८ ते १२३ पर्यंत राज्य केलें असावें. त्याचा मुलगा हुविष्क अगर हुष्क हा त्याच्यामागून गादीवर आला. यानें मथुरेस फार मोठ्या विहाराची स्थापना केली व त्याला आपले नांव दिलें. याच्यानंतर वसुष्क अगर जष्क हा गादीवर आला. यालाच वासुदेव म्हणत असत. या नांवावरून या राजावर हिंदुधर्माचा पगडा बसत चालला असें दिसतें. याच्या नाण्यांवर त्रिशूलधारी नंदीवर बसलेल्या शिवाचें चित्र आहे. या राजाच्या वेळचे कांहीं शिलालेख मथुरेस सांपडले आहेत. या राजानेही पंचवीस वर्षे राज्य केलें, असें नाण्यांवरून दिसतें. मथुरेसंबंधी विचार करतां या कुशन घराण्याच्या कारकीर्दीत मथुरा हे शहर फार भरभराटीत होतें यांत शंका नाहीं. येथें बुद्ध व जैनधर्मी व्यापारी फार होते, व त्यांना दिलेल्या देणग्यांचे शिलालेख येथे पुष्कळ सांपडले आहेत. संस्कृतांतील प्रसिद्ध ग्रंथ पंचतंत्र याच्या प्रारंभींच दक्षिणेंतील महिलरोप्य या शहरांतून आपल्या बैलगाडीत माल भरून मथुरेस जाणाऱ्या गाडयांच्या तांड्याला जाऊन मिळणाऱ्या वर्धमानक नांवाच्या वाण्याच्या मुलाची गोष्ट आहे. मथुरेस पोंचल्यावर त्याचा एक बैल यमुनेंत नदीच्या तीराला गेला व चिखलांत बुडून मेला, अशा प्रकारचें वर्णन आहे. यावरूनही मथुरेची व्यापाराकरितां त्या वेळीं प्रख्याति होती असें दिसतें. कनिष्क राजाच्या वेळचे ७१ शिलालेख सांपडले आहेत. त्यांतले खुद्द मथुरेंत ४३ सांपडले आहेत. या शिलालेखांवरून व मथुरेत सांपडलेल्या दुसऱ्या इमारतींच्या भागांवरून, तसेंच कठडे, मूर्ति वगैरे गोष्टींवरून कुशन कारकीर्दीत व त्याच्यापुढें बरींच शतकें मथुरा शिल्पकलेकरिता प्रसिद्ध होतें, व मथुरेची शिल्पपद्धति म्हणून एक शिल्पपद्धति होती. असें<noinclude>{{right|[ ९३ }}</noinclude>
bxrv15alklf3wslvf0mxvr0k4003th9
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०७
104
110493
230528
2026-05-30T10:46:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230528
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>दिसतें. तिच्यावर ग्रीक शिल्पाचा परिणाम झाला होता. तरी पद्धति पूर्णपणें हिंदू होती. या कलेचा ऱ्हास सहाव्या शतकांत झाला.
{{gap}}इसवी सनाच्या ३२० च्या सुमारास पाटलीपुत्रास प्रसिद्ध गुप्त घराणें उदयास आलें. चंद्रगुप्त हा पहिला राजा झाला. त्याचा मुलगा समुद्रगुप्त हा फारच पराक्रमी निघाला, व त्याने सर्व गंगेच्या कांठचा मुलूख आपल्या ताब्यांत आणला व दक्षिणेपर्यंत राजांना मांडलिक केलें. या गुप्तघराण्याचें साम्राज्य बंगालच्या उपसागरापासून तो थेट सिंधुनद व काठेवाड येथपर्यंत सर्व उत्तरहिंदुस्थानभर झालें. अर्थात् मथुरा व मथुराप्रांत गुप्त राजांच्या ताब्यांत आला. याच काळ चिनी प्रवासी फेहेअन हा हिंदुस्थानांत आला होता. तो तिबेटांतून निघून काश्मीर, काबूल कंदाहार व पंजाबमधून मध्यहिंदुस्थानांत आला, व मथुरेंत एक महिना राहिला. मथुरा व त्याच्या आसपास एकंदर वीस विहार होते, व त्यांत तीन तीन हजार बुद्ध भिक्षु रहात असत; तसेंच येथे सहा स्तूप होते, असें त्यानें लिहून ठेविलें आहे. यावरून मथुरेस अजून बुद्धधर्माचें पुष्कळ प्राबल्य होतें असें दिसतें, परंतु इसवी सनाच्या ५०० च्या सुमारास हूण लोकांच्या स्वाऱ्या हिंदुस्थानावर होऊ लागल्या, व त्यांनी गुप्तघराण्याचे साम्राज्य मोडून टाकलें. परंतु पुढे हुणांची सत्ता फार दिवस टिकली नाहीं. ठाणेश्वराच्या हर्षवर्धनानें मोठें साम्राज्य स्थापिलें, परंतु त्याच्या पश्चात् त्याचाही नायनाट झाला, व सन ७०० पासून १०२४ पर्यंत कनोजच्या घराण्याचे साम्राज्य चालू झालें. सुमारे ७०० पासून मथुरेतून बुद्ध व जैनधर्म पार नाहींसा झाला व मधुरा हे कृष्णाच्या भक्तीचे मोठें स्थान झालें व तेव्हांपासून ते हिंदु लोकांचें काशीप्रमाणेच फार मोठे पवित्र स्थान बनले व म्हणून मुसलमानी स्वाऱ्या येऊं लागल्यापासून सोमनाथाप्रमाणें मथुरा हेंही एक मुसलमानांचें मोठें छलस्थान बनले. सर्व मुसलमानी अंमलांत मथुरेची अवस्था मोठी कठीण होती. कारण, आग्रा व दिल्ली या दोन मुसलमानी राजधान्या बनल्यामुळें मथुरा या हिंदु पवित्र स्थानाची कैचीच्या दोन पातींत सांपडल्याप्रमाणे हुबेहुब स्थिति झाली.
{{gap}}गिझनीच्या महमदानें हिंदुस्थानावर पहिली स्वारी १००१ मध्ये केली.<noinclude>
{{gap}} ९४ ]</noinclude>
agwfiglf11ik7nllr1xnr4y8qicypb4
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०८
104
110494
230529
2026-05-30T10:53:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230529
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कृष्णकथा.'''}}</noinclude>त्यानें एकंदर बारा स्वाऱ्या केल्या, हें इतिहासज्ञांस महशूरच आहे. त्यांपैकी नववी स्वारी त्यानें १०१७ मध्ये केली. या स्वारींत त्यानें मथुरा शहर लुटलें व तेथली हिंदु देवळें उध्वस्थ केली. या लुटीमुळे शहराची फारच नासाडी झाली, पुढें अकबराच्या काळापर्यंत या शहराची फारशी माहिती मिळत नाहीं. परंतु मुसलमानी धर्मवेड्या राजांचा हिंदुधर्माचें एक ठिकाण म्हणून या शहरावर नेहमी डोळा असे; यामुळे शहराची भरभराट होऊ शकली नाहीं. परंतु अकबराच्या कारकीर्दीतील सहिष्णुतेच्या धोरणानें मथुरा व वृंदावन या शहरांना पुन्हां धार्मिक महत्त्व आले व त्या शहराची व तेथील गोसाव्यांची कीर्ति इतकी वाढली कीं, अकबराला त्यांना भेटण्याची इच्छा झाली, व अकबराचे डोळे बांधून त्याला वृंदावनांतील अत्यंत पवित्र अशा तुळशीवृंदावनाच्या राजीमध्ये आणिलें, ब तेथील आश्चर्यकारक देखावा पाहून त्या स्थानाच्या पवित्रपणाबद्दल अकबराची खात्री झाली. या गोष्टींचें स्मारक म्हणून तेथील लोकांनीं बादशहाच्या परवानगीनें गोविंददेव, गोपीनाथ, युगलकिशोर व मदनमोहन या नांवाने प्रसिद्ध असणारी देवळें बांधलीं. जरी हीं शहरे व हा प्रांत मोंगलांच्या ताब्यांत होता, तरी औरंगझेबापर्यंत या शहराला त्रास पोंचला नाहीं. परंतु औरंगझेबाच्या कारकीर्दीत मात्र या पवित्र स्थानाचा फार छल झाला. औरंगझेबाचा थोरला मुलगा मथुरा शहरांत जन्मला, व त्याने राज्यावरील आपला हक्क मथुरेमध्यें प्रथमतः जाहीर केला. मथुरेस एक मुसलमान अधिकारी नेमला गेला. यानें हल्लीं मथुरेंत असलेली प्रसिद्ध मशीद बांधली. येथें जाट लोकांचें बंड झाले. औरंगझेबाला आपल्या हिंदुधर्माविरुद्ध मोहिमेस ही एक आणखी बरी सबब झाली असें वाटलें. त्यानें स्वतः मोठ्या सैन्यानिशीं मथुरेस येऊन मथुरा व वृंदावन येथील उत्तम उत्तम देवळें पाडली. विशेषतः त्याचा डोळा केशवदेव या फार पवित्र मानलेल्या देवळावर होता. तें देऊळ पार पाडून त्याच्याच पायावर औरंगझेबाने मोठी मशीद बांधविली. औरंगझेबाचे धर्मवेड इतके वाढलें कीं, त्यानें मथुरा वृंदावन हीं नांवेंच इतिहासांतून नाहींशी करण्याचा बेत केला. मधुरेला कागदोपत्रीं इसलामाबाद व<noinclude>{{right|[ ९५ }}</noinclude>
0lv9iwxwzo5l53k4dmerdrkm4z9psl9
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१०९
104
110495
230530
2026-05-30T10:58:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230530
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>वृंदावनास मुमीनाबाद अशीं नांवें ठेवलीं. परंतु ज्याप्रमाणे औरंगझेबाच्या पश्चात् मोंगलांचा अंमल नामशेष झाला, त्याप्रमाणे या शहरांचीं हीं नांवेंही कागदोपत्रींच राहिली. औरंगझेबाच्या पश्चात् जाट व मराठे यांनीं आग्रा दिल्लीपर्यंतच्या मुलखावर आपले वर्चस्व स्थापले व त्यामुळे कांहीं दिवस मथुराप्रांत जाटांच्या ताब्यांत होता, तर कांहीं दिवस मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढे इंग्रजांची व मराठ्यांची उत्तरहिंदुस्थानांत पुष्कळ वेळां युद्ध झाली व मथुराप्रांत १८५० मध्ये इंग्रजांच्या ताब्यांत आला. १८५७ सालच्या बंडाच्या वेळीं मथुरेसही या बंडाचा थोडाफार प्रादुर्भाव झाला होता. परंतु तेथल्या मुख्य शेटजीच्या घराण्याच्या राजनिष्ठेमुळें मथुरेचा बराच बचाव झाला, व मथुरा शहराला फारसें कडक प्रायश्चित्त भोगावे लागलें नाहीं. तेव्हांपासून या शहराची भरभराट होत आहे.
{{gap}}आतां मथुरा वृंदावनासंबंधीं एका गोष्टींचा विचार करावयाचा राहिला. तो हा कीं, मथुरावृंदावन आणि कृष्णजन्म व कृष्णलीला यांचा आपल्या पुराणाप्रमाणें जो फार निकट संबंध मानिला आहे, व म्हणून मथुरा हे राधाकृष्णाच्या भक्तिपंथाचें जें फार मोठें पवित्र स्थान मानिले आहे, या गोष्टी कितपत खऱ्या आहेत. माझ्या बाळपणापासून कृष्ण जन्माच्या व कृष्णलीलांच्या कथा मला चिरश्रुत असल्यामुळे मला मथुरावृंदावन पाहण्याची विलक्षण जिज्ञासा होती. परंतु प्रत्यक्ष मथुरेंतील पवित्र स्थानें पाहून, तसेंच त्यांचे व तेथील देवळांचे अर्वाचीनत्व पाहून, माझी फार निराशा झाली, व हल्लींचें मथुरा शहर व हल्लींची कृष्णभक्ति हीं बरींच अर्वाचीन असावी अशी माझी कल्पना झाली. म्हणून यासंबंधानें मी चवकशी करूं लागला. तों मला समजलें, कीं, माझें पूज्य गुरुवर्य डॉ० सर रामकृष्ण भांडारकर यांनी वैष्णव पंथाच्या उदयाबद्दल एक ग्रंथ लिहिला असून तो जर्मनीमध्यें छापला जात आहे<ref>हा ग्रंथ वैष्णव, शैव व इतर धार्मिक पंथ यांचा इतिहास म्हणून आतां प्रसिद्ध झाला आहे.</ref>. त्यांत कृष्णाची कथा व कृष्णभक्ति यांची उत्पत्ति व<noinclude>
{{gap}} ९६ ]

{{reflist}}</noinclude>
ru8x5t3xwh5ncvtv60ib8jaq8s1y6dj
230531
230530
2026-05-30T11:01:16Z
कल्पनाशक्ती
3813
230531
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>वृंदावनास मुमीनाबाद अशीं नांवें ठेवलीं. परंतु ज्याप्रमाणे औरंगझेबाच्या पश्चात् मोंगलांचा अंमल नामशेष झाला, त्याप्रमाणे या शहरांचीं हीं नांवेंही कागदोपत्रींच राहिली. औरंगझेबाच्या पश्चात् जाट व मराठे यांनीं आग्रा दिल्लीपर्यंतच्या मुलखावर आपले वर्चस्व स्थापले व त्यामुळे कांहीं दिवस मथुराप्रांत जाटांच्या ताब्यांत होता, तर कांहीं दिवस मराठ्यांच्या ताब्यात होता. पुढे इंग्रजांची व मराठ्यांची उत्तरहिंदुस्थानांत पुष्कळ वेळां युद्ध झाली व मथुराप्रांत १८५० मध्ये इंग्रजांच्या ताब्यांत आला. १८५७ सालच्या बंडाच्या वेळीं मथुरेसही या बंडाचा थोडाफार प्रादुर्भाव झाला होता. परंतु तेथल्या मुख्य शेटजीच्या घराण्याच्या राजनिष्ठेमुळें मथुरेचा बराच बचाव झाला, व मथुरा शहराला फारसें कडक प्रायश्चित्त भोगावे लागलें नाहीं. तेव्हांपासून या शहराची भरभराट होत आहे.
{{gap}}आतां मथुरा वृंदावनासंबंधीं एका गोष्टींचा विचार करावयाचा राहिला. तो हा कीं, मथुरावृंदावन आणि कृष्णजन्म व कृष्णलीला यांचा आपल्या पुराणाप्रमाणें जो फार निकट संबंध मानिला आहे, व म्हणून मथुरा हे राधाकृष्णाच्या भक्तिपंथाचें जें फार मोठें पवित्र स्थान मानिले आहे, या गोष्टी कितपत खऱ्या आहेत. माझ्या बाळपणापासून कृष्ण जन्माच्या व कृष्णलीलांच्या कथा मला चिरश्रुत असल्यामुळे मला मथुरावृंदावन पाहण्याची विलक्षण जिज्ञासा होती. परंतु प्रत्यक्ष मथुरेंतील पवित्र स्थानें पाहून, तसेंच त्यांचे व तेथील देवळांचे अर्वाचीनत्व पाहून, माझी फार निराशा झाली, व हल्लींचें मथुरा शहर व हल्लींची कृष्णभक्ति हीं बरींच अर्वाचीन असावी अशी माझी कल्पना झाली. म्हणून यासंबंधानें मी चवकशी करूं लागला. तों मला समजलें, कीं, माझें पूज्य गुरुवर्य डॉ० सर रामकृष्ण भांडारकर यांनी वैष्णव पंथाच्या उदयाबद्दल एक ग्रंथ लिहिला असून तो जर्मनीमध्यें छापला जात आहे<ref>हा ग्रंथ वैष्णव, शैव व इतर धार्मिक पंथ यांचा इतिहास म्हणून आतां प्रसिद्ध झाला आहे.</ref>. त्यांत कृष्णाची कथा व कृष्णभक्ति यांची उत्पत्ति व<noinclude>
{{reflist}}

{{gap}} ९६ ]</noinclude>
hgjvdwvuiz9sqzhz2rhzfm4udu7vcuq
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११०
104
110496
230532
2026-05-30T11:21:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230532
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कृष्णकथा.'''}}</noinclude>वाढ यांचा इतिहास सांगितला आहे; ह्मणून मीं डॉक्टरसाहेबांकडे जाऊन त्या ग्रंथाची एक हस्तलिखित प्रत मागून घेतली. डॉक्टरसाहेबांनीं ती मोठ्या आनंदाने मला दिली व त्यांतील माहितीचा उपयोग करण्याची परवानगी दिली, याबद्दल मी डॉक्टरसाहेबांचा फार ऋणी आहे. या पुढील मजकुरांत त्यांच्या ग्रंथांतील पुष्कळ माहितीचा उपयोग केलेला आहे, हें निराळे सांगावयास नकोच.
{{gap}}कृष्णचरित्राबद्दल आपण विचार करूं लागलों, म्हणजे कितीतरी गोष्टींबद्दल शंका उत्पन्न होतात. प्रथमतः ही चमत्काराची गोष्ट वाटते, की, महाभारतामध्ये जो सूत्रधार वाटतो, महाभारतांतील प्रचंड युद्धामध्ये ज्याच्या कारस्थानाला एक प्रकारें प्रमुखस्थान मिळालें आहे, त्या कृष्णाची जन्मकथा व त्याच्या बालपणाच्या आयुष्याची हकीकत महाभारतांत कोठेही दिसत नाहीं. शांतिपर्वाच्या नारायणीय प्रकरणांत कृष्णाच्या अवताराचा व कंसवधाचा भविष्यकाळी होणाऱ्या गोष्टींप्रमाणें मात्र उल्लेख आहे. कृष्णजन्म व त्याचा बालपणाचा गोकुळांतील वास व तेथील गोपींशीं त्याची क्रीडा, वगैरे भाग सविस्तरपणे हरिवंशांत व भागवतांत मात्र दिसून येतात. परंतु हे ग्रंथ महाभारतापेक्षां बरेच अर्वाचीन आहेत. तसेंच भगवद्गीतेतील उदात्त तत्वज्ञान शिकविणारा, महाभारतांतील राजकीय कारस्थानांत गुंतलेला, व केव्हां केव्हां कुटिलनीतीनें कां होईना, परंतु सत्पक्षाच्या बाजूनें भांडणारा कृष्ण, व सोळा सहस्र बायका असणारा, गोपींशी अनिर्बंध व्यवहार करणारा, अत्यंत विलासी व विषयलंपट असा गोकुळींचा कृष्ण हे एकच असावे याबद्दल शंका येते. थिऑसॉफिकपंथी लोकांनी गोपींच्या व्यवहाराला कितीही आध्यात्मिक स्वरूप दिले असलें तरी हा मागूनचा विचार आहे, यांत शंका नाहीं. या सर्व शंकांचे निरसन डॉक्टर सर भांडारकरांनी काढलेल्या कल्पनेने उत्तम तऱ्हेनें होतें. डॉक्टर भांडारकरांचें म्हणणे असे आहे, कीं, हल्लीं जी कृष्णाच्या आयुष्याची गोष्ट हरिवंशांत व भागवतांत दिसते, ती दोन गोष्टींच्या भेसळीने झालेली आहे. विशेषतः भगवद्गीतेचा कृष्ण व गोकुळींचा कृष्ण या दोन निरनिराळ्या व्यक्ति असाव्या. पहिलीला त्यांनीं वासुदेवकृष्ण व दुसरीला<noinclude>{{right|[ ९७ }}</noinclude>
4f9hjpxmutp69w4wd46a08em3bnupx3
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१११
104
110497
230533
2026-05-30T11:25:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230533
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>गोपालकृष्ण म्हटले आहे. कृष्णाला कृष्ण हें नांवही मागाहून मिळालेले दिसतें. मूळचें नांव वासुदेव हेंच असावें. या यादव कुळांतील वृष्णिवंशांत उत्पन्न झालेले वासुदेव व बलदेव या नांवाने प्रसिद्धीस आलेले दोन क्षत्रियकुमार असावे, त्यांनी आपल्या मामाला मारून मथुरेचें राज्य मिळविलें असावें, व पुढे कालयवन या नांवाच्या म्लेच्छं राजाने मथुरेवर स्वारी केली असावी, व म्हणून त्यांना मथुरा सोडून द्वारकेस जावें लागलें असावें. अशा प्रकारची ऐतिहासिक पुरुषांची मूळची गोष्ट असावी, व पुढे या पुरुषांना देवाचे अवतार असे मानण्यांत आलें असावें, व मग वासुदेवभक्ति सुरू झाली असावी. कृष्णाच्या जन्माची कथा व त्याचा गोकुळांतील वास या गोष्टी आबालवृद्धांना ठाऊकच आहेत. तेव्हां त्यांची येथे पुनरुक्ति करण्याची गरज नाहीं. परंतु ही एक ऐतिहासिक घडलेली गोष्ट असावी, अशाबद्दल पालीभाषेतही दाखला सांपडतो. ऐकीव गोष्टीमध्ये ज्याप्रमाणे थोडाफार फरक होत जातो, तेवढाच फरक या दोन गोष्टींत दिसून येतो. पालींतील या गोष्टीला घटजातक म्हणतात. ती गोष्ट थोडक्यांत अशी आहे:-
{{gap}}पूर्वी एकदां उत्तरापथ देशांत कंस प्रांतांत असितंजना नांवाचें शहर होतें. तेथे महाकंस नांवाचा राजा राज्य करीत होता. त्याला कंस आणि उपकंस या नांवाचे दोन मुलगे व देवगभ्भा नांवाची एक मुलगी झाली. मुलीच्या जन्मकाल ब्राह्मणांनी 'या मुलीच्या पोटीं झालेल्या पुत्रांपासून कंसकुलाचा नाश होईल.' असे भविष्य वर्तविलें. राजाला मुलगी प्रिय असल्यामुळे त्याच्याने तिला मारवलें नाहीं. आपले मुलगे काय पाहिजे तें करोत, असें म्हणून तो मेला. त्याच्यानंतर कंस राज्यावर आला व उपकंस एका प्रांताचा अधिकारी झाला. आपल्या बहिणीस ठार मारल्यास आपल्याबद्दल फार गवगवा होईल, असें जाणून त्यानें तिला अविवाहित ठेवण्याचा विचार करून व तिच्याकरितां एक वाटोळा मनोरा तयार करून त्यांत तिला कोंडून ठेविलें. नंदगोपा व तिचा पति अंधकवेणू ही देवगम्भेच्या तैनातीस होतीं. उत्तरमथुरेंत महासागर या नांवाचा राजा होता. त्याला सागर व उपसागर नांवाचे दोन मुलगे होते. महा-<noinclude>
{{gap}} ९८ ]</noinclude>
puix5d6h2l4zv3dzr3lva977hotekkd
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११२
104
110498
230534
2026-05-30T11:35:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230534
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कृष्णकथा.'''}}</noinclude>सागराच्या पश्चात् सागर राज्यावर आला व उपसागर एका प्रांताचा अधिकारी झाला. उपकंस व उपसागर यांची फार मैत्री होती. उपसागरानें सागराच्या राणीमहालांत कांहीं खटपट केली, व ती उघडकीस आल्यावरून उपसागरास तेथून हाकलून देण्यांत आलें. तो उपकंसाच्या प्रांतांत आला. उपकंसानें आपल्या मित्राची राजाशी ओळख करून दिली. राजाच्या भेटीला जात असतां त्यानें तो मनोरा पाहिला, व त्याबद्दल हकीकत विचारली; आणि देवगम्भेबद्दल हकीगत कळल्यावर तिच्यावर त्याचें प्रेम जडलें. एके दिवशी देवगम्भेनें राजाकडे जातांना उपसागरास पाहिले व तिनें त्याच्याबद्दल नंदगोपेजवळ चवकशी केली; व हा महासागराचा मुलगा आहे असें समजल्यावर तिचेंही त्याच्यावर प्रेम जडलें. उपसागरानें नंदगोपेजवळ देवगम्भेला भेटण्याबद्दल गोष्ट काढली व तिनें दोघांची मनोऱ्यांत एकांतांत गांठ घालून दिली. पुढे देवगम्भेला गर्भ राहिला, ही गोष्ट कंसाच्या कानांवर गेली. देवगम्भेला क्षमा करण्याचे वचन घेऊन नंदगोपेनें खरा प्रकार त्या दोघां भावांना सांगितला. तो ऐकिल्यावर भावांनी विचार केला कीं, आपल्या बहिणीला आपल्याला मारतां येत नाहीं; हिला मुलगी झाली तर बरेंच; मुलगा झाला तर मारूं असें म्हणून त्यांनीं देवगम्भेचा उपसागराशीं विवाह करून दिला. पूर्ण दिवस झाल्यावर देवगम्भा कन्यारत्न प्रसवली. त्या भावांना आनंद झाला. मुलीचें नांव अंजना ठेऊन त्यांनीं देवगम्भा व उपसागर यांना गोवद्धमान नांवाचें खेडें राहण्यास दिलें, व तेथें तीं आनंदानें राहूं लागलीं. देवगम्भा पुन्हां गरभार राहिली. व त्याच वेळीं नंदगोपाही गरभार राहिली. पूर्णमास झाल्यावर एके दिवशीं देवगम्भेला मुलगा व नंदगोपेला मुलगी झाली. आपल्या मुलाला आपले भाऊ मारतील या भीतीनें देवगम्भेनें गुप्तपणे आपला मुलगा नंदगोपेकडे पाठविला, व तिची मुलगी आपल्याकडे आणविली. याचा त्या भावांना मागमूसही लागला नाहीं. याप्रमाणें देवगभ्भेस दहा मुलगे झाले, व नंदगोपेस दहा मुली झाल्या. देवगम्भेचे मुलगे अंधकवेणूच्या घरी वाढत चालले. हे मुलगे मोठे बलवान निपजले. त्यांच्यापैकी पहिल्या दोघांचीं नांवें वासुदेव व बलदेव अशीं होतीं. हे<noinclude>{{right|[ ९९ }}</noinclude>
ok2mhnw33txq7jx0toy35oqlwp4s15b
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११३
104
110499
230535
2026-05-30T11:46:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230535
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>मुलगे मोठे झाल्यावर खेड्यांतील लोकांशीं दांडगाईनें वागूं लागले. आणि त्यांच्या मालमत्तेची लुटालूट करूं लागले. याबद्दल कंसाकडे तक्रार नेण्यांत आली. राजानें अंधकवेणूस बोलावून मुलांच्या अत्याचाराबद्दल त्याची कानउघाडणी केली. आणखी एकदोनदां तक्रार आल्यामुळे राजानें अंधकवेणूस मरणाची भीति घातली. अंधकवेणूनें राजाकडून अभयवचन घेऊन हे मुलगे आपले नव्हेत, हे देवगम्भेचे सुलगे आहेत, असे सांगितले. राजानें आपल्या मंत्र्यांना विचारलें, आतां यांना कसें धरावें? मंत्र्यांनी सांगितले, "ते मोठे मल्लयोद्धे आहेत, तेव्हां शहरांत मल्लयुद्धाचा आखाडा तयार करावा व ते आले म्हणजे त्यांना पकडून ठार करावें." राजाने त्यांच्या सांगण्याप्रमाणे शहरांतील चाणूर व मुष्टिक या दोघां मल्लयोध्यांना आपला बेत कळविला व "आज पासून सात दिवसांनी मल्लयुद्धाचा खेळ होईल," म्हणून सर्व शहरांत द्वाही फिरविली, व आपल्या राजवाड्यासमोर प्रचंड आखाडा तयार करविला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी पाहण्यास जमल्या. वासुदेवबलदेवप्रभृति सर्व बंधु त्या खेळाला आले. वाटेंत त्यांनी शहरांतील शिंप्यांपासून, माळ्यांपासून, गंध्यांपासून, कपडे माळा व सुगंधी सामान हिसकावून घेऊन ते अंगावर घालून ते आखाड्यांत येऊन सज्ज झाले. चाणूर व मुष्टिक हे मल्लयोद्धेही आखाड्यांत आले. इतक्यांत बलदेवानें एक दोरी घेऊन ती चाणूराच्या कमरेभोंवतीं गुंडाळून ती दोरी घट्ट आवळून त्याने चाणूरास पटकन् उचलून गरगर फिरविलें व त्याला जमिनीवर आपटले व मग आखाड्याच्या बाहेर फेंकून दिलें. नंतर मुष्टिक आला. त्यालाही बलदेवानें मुष्टिप्रहार केला. "मी मल्लयोद्धा नाहीं!" असें तो ओरडूं लागला. "मल्लयोद्धा अस अथवा नस मला सारखेच आहे!" असें म्हणून बलदेवानें त्यालाही जमिनीवर आपटून त्याचा प्राण घेतला. मुष्टिक मरतां मरतां म्हणाला, "मी भूत होऊन यांचा घात करीन." इतके झाल्यावर राजा म्हणाला, "या दहाजणांना येथून घेऊन जा." इतक्यांत वासुदेवाने त्या दोघां भावांवर एक चक्र फैकले व त्याच्या योगेंकरून त्याने दोघां भावांची डोकीं उडविलीं.
{{gap}}याप्रमाणें आपल्या मामांना मारून त्या भावांनी तेथलें राज्य मिळविलें व<noinclude>
{{gap}}१०० ]</noinclude>
736l0dyj6m8xw1xvr62bl6ihs86lwa8
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११४
104
110500
230536
2026-05-30T11:52:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230536
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कृष्णकथा.'''}}</noinclude>आपल्या मातापितरांना असितंजना शहरी आणिलें. पुढें त्यांनी सर्व हिंदुस्थान जिंकण्याचा बेत केला. ते कालसेन राजाच्या अयोध्या शहरी आले व राजाचा पराभव करून त्यांनी तें राज्य मिळविले. पुढे ते द्वारावतीस आले. त्या शहराच्या एका बाजूस समुद्र व दुसऱ्या बाजूस पर्वत होता व त्या शहरांत एक भूत होतें; कोणी शत्रु आल्यास ते भूत गाढवाचें रूप घेऊन ओरडत असे, आणि असें झालें म्हणजे ती द्वारावती हवेंत उडून जाऊन समुद्रांतील एका बेटावर जाई, व शत्रु परत गेल्यावर परत आपल्या जागेवर येई. यामुळें तें शहर काबीज करणे अशक्य होते; म्हणून ते बंधु कण्हदीपायनकडे गेले. त्यानें त्यांना त्या गाढवाला प्रसन्न करण्याची युक्ति सांगितली, व गाढवानेही शहराच्या चार द्वाराजवळ चार लोखडी खांब पुरून त्यांना चार लोखंडी नांगर साखळदंडांनी बांधाल, तर मी ओरडलों तरी शहर उडणार नाहीं, असें सांगितले." बंधूनी सांगितल्याप्रमाणें केलें व म्हणून शहर त्यांच्या ताब्यांत आलें.
{{gap}}क्रमाक्रमानें त्यांनीं सर्व हिंदुस्थान जिंकलें व सर्व राज्याचे दहा भाग करून त्यांनी आपसांत वांटून घेतले. ते बहिणीला विसरले होते, परंतु शेवटच्या भावाने आपला वांटा त्या बहिणीस देऊन तो व्यापार करून आपले पोट भरूं लागला. या सर्व भावांना पुढे पुत्रपौत्र झाले. एकदां वासुदेवाचा पुत्र वारला. त्यामुळे त्याला अत्यंत दुःख झाले व तें आवरेना, परंतु घटपंडित म्हणून त्या भावापैकीं जो शहाणा भाऊ होता, त्यानें अशक्य गोष्टीबद्दल शोक करणें बरें नव्हे, असें आपल्या भावाच्या मनांत बिंबवून त्याचं दुःख नाहींसें केलें.
{{gap}}पुष्कळ काळानंतर एकदां या भावांच्या पुत्रांना वाटलें, "कण्हदीपायन (कृष्णद्वैपायन) यांना दिव्यदृष्टि आहे असे म्हणतात. तर त्यांची आपण परीक्षा करूं या." तेव्हां त्यांनी एका तरुण मुलास बायकोचा वेष देऊन त्याच्या पोटावर उशी बांधून त्याला गरभार बाई बनविलें, व कण्हदीपयनापुढे त्याला उभे करून "ही बाई बाळंत केव्हां होईल?" म्हणून विचारलें, कण्हदीपायनानें अन्तर्दृष्टीनें पाहिलें, कीं, दहा भावांचा नाश समीप आला आहे, व आपणही आजच मरणार. तेव्हां तो म्हणाला,<noinclude>{{right|[ १०१ }}</noinclude>
cm8lg8m8v9sgfkmegc9ucevu9mlvyho
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११५
104
110501
230537
2026-05-30T11:58:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230537
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>"आजपासून सातवे दिवशी या मनुष्याला एक खदीर झाडाची गांठ मूल होईल. व ती गांठ जरी तुम्ही जाळून तिची राखरांगोळी केलीत, तरी ती वासुदेवाच्या कुळाचा नाश करील."
{{gap}}या म्हणण्याबद्दल त्या साधूची थट्टा करून त्या मुलांनी कण्हदीपायनास फांस घालून ठार केलें. भावांना जेव्हां हें वर्तमान कळले तेव्हां ते घाबरले व त्यांनी त्या बायकोचें सोंग दिलेल्या पुरुषावर पहारा ठेवून जेव्हां तो ती खदीराची गांठ प्रसवला, तेव्हां ती गांठ त्यांनी जाळून त्याची राख नदीत फेंकून दिली; पण ती राख मागच्या एका फाटकाजवळ अडकून राहिली व तेथे लव्हाळे उगवलें.
{{gap}}एके दिवशीं सर्व भावांना जलक्रीडा करण्याची इच्छा झाली म्हणून त्यांनी मोठा मंडप तयार करून ते मागच्या फाटकाला आले. तेथें ते यथेच्छ खाल्ले-प्याले व आपआपसांत दोन टोळ्या करून धिंगामस्ती करूं लागले व हातघाईवर आले. एकानें एक लव्हाळा मोडला. परंतु त्या लव्हाळ्याचें लागलेच एक मुद्गल बनले व याप्रमाणें सर्वांच्या हातांत मुद्गल झाले व ते एकमेकांना ठार करूं लागले. शेवटीं वासुदेव, बलदेव, त्यांची बहीण अंजना व एक उपाध्याय इतकी मंडळी राहिली. ते एका रथांत बसून पळून गेले, ते कालमरीका या वनांत गेले. तेथें मुष्टिक भूत होऊन राहिला होता. त्यांना पाहण्याबरोबर त्या भूतानें तेथें एक खेडे बनवून आपण मल्लयोद्धा होऊन पुढे आला. बलदेवानें त्याच्याशीं युद्ध खेळण्याकरितां रथाखाली उडी टाकली. त्या भुतानें बलदेवास आपल्या मुठीत धरून त्याचा प्राण घेतला. बलदेवाचा मृत्यु पाहून, वासुदेव बाकी दोघांसह रथांत बसून, तसाच पुढे गेला व एका खेडेगांवीं आला. तेथे तो एका झुडुपांत विश्रांतीकरितां थांबला. त्यानें आपल्या बहिणीला व उपाध्यायाला अन्न आणण्यास गांवांत पाठविलें. इकडे झुडुपांत हालचाल पाहून जरा या नांवाच्या शिकाऱ्यानें एक बाण मारिला. तो वासुदेवाच्या पानाला लागला. जरेनें जखम केली म्हणजे मनुष्य जगत नाहीं, या म्हणीप्रमाणें आपण आतां मरणार असें वासुदेवास वाटलें व त्यानें मी आतां<noinclude>
{{gap}}१०२ ]</noinclude>
h4ywmnuo6j7jolmvmeuf87gd334lmaa