विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.4
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf
106
85681
230547
230523
2026-05-31T06:28:48Z
कल्पनाशक्ती
3813
230547
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=माधव रामचंद्र जोशी
|Address=पुणे
|Year=1920
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="अनुक्रमणिका" 6="फोटो" 7="फोटो" 8="नैनिताल" 24="फोटो" 25="फोटो" 29="ग्वालेर" 42="फोटो" 43="फोटो" 48="हरिद्वार किंवा गंगाद्वार" 65 ="गुरुकुल" 85 ="मथुरावृंदावन" 103="कृष्णकथा व वैष्णवपंथ"/>
|Volumes=
|Remarks={{scrollpane|border=1px dashed silver|height=600px|width=400px|
{{पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५}}

|Width=
|Css=
|Header=
|Footer=

njznwrj9pip1lk1n9t7c6km3nexu92g
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/५
104
110391
230555
230348
2026-05-31T06:43:00Z
कल्पनाशक्ती
3813
230555
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना.'''}}}}

{{gap}}इंग्रजी शाळांतील शेवटची परीक्षा घेणाऱ्या संयुक्त बोर्डाने माझ्या प्रवासवृत्तांपैकी हा पहिला भाग १९२१ सालच्या परीक्षेकरितां नेमला, म्हणूनच या भागाची दुसरी आवृत्ति इतक्या लवकर काढण्याचे कारण पडलें. माझ्या प्रवासवर्णनाचा प्रथमप्रयत्न बोर्डाच्या मेंबरांस पसंत पडून त्यांनीं हें पुस्तक मराठी विषयाकरितां नेमून माझ्या पुस्तकाचें गौरव केलें याबद्दल संयुक्त बोर्डाचा मी आभारी आहे. या आवृत्तीत आठ चित्रे घातली आहेत व किरकोळ चुक्या नजरेस आल्या त्या दुरुस्त केल्या आहेत. आतां हे पुस्तक पुष्कळ शिक्षकांच्या नजरेखालून अवश्यमेव जाईल. तरी त्यांनी या पुस्तकांत दिसून येणारे दोष मला कळविले तर मजवर त्यांचे उपकार होतील.

{| {{brace table parameters}}
|वुइलिंगडन कॉलेज, सांगली,||{{brace|r|t}}||

|||{{brace|r|m}}||{{gap}}'''गोविंद चिमणाजी भाटे.'''

|ता. १४/११/१९.||{{brace|r|b}}||

{{rule|5em}}

{{center|{{xx-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}}
{{rule|5em}}

| १ {{gap}} || [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]] || १

| २ || [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर|ग्वालेर.]] || २०

| ३ || [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार|हरिद्वार किंवा गंगाद्वार.]]{{gap}} || ३७

| ४ || [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल|गुरुकुल.]] || ५२

| ५ || [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन|मथुरावृंदावन.]] || ७२

| ६ || [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/कृष्णकथा व वैष्णवपंथ|कृष्णकथा व वैष्णवपंथ.]] || ९०

{{nop}}<noinclude></noinclude>
cnc7ov1fbsya12g2q75c0fgtxtfllhe
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११६
104
110502
230538
2026-05-30T12:05:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230538
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''कृष्णकथा.'''}}</noinclude>मरणार असें आपल्या बहिणीस सांगून व तिच्या व उपाध्यायाच्या उपजीविकेकरितां त्यांना एक विद्या शिकवून वासुदेवानें प्राण सोडला.
{{gap}}ही गोष्ट हरिवंश व भागवत यांतील गोष्टीशीं पुष्कळ तऱ्हेने जमते, हे वाचकांच्या तेव्हांच लक्षांत येईल, या गोष्टींत जरी नंदगोपा हे नांव आलेले आहे, तरी गौकुळांतील गोष्टीचा यांत फारसा संबंध नाहीं, असें दिसून येईल. या गोष्टींत कृष्ण हें नांवही नाहीं. वासुदेव व बलदेव किंवा त्याचें दुसरे नांव संकर्षण ह्रीं नांवें मात्र फार जुनीं आहेत.
{{gap}}वासुदेव या शब्दाचा पाणिनीनें व पतंजलीने पूजार्ह असा अर्थ दिला आहे. यावरून वासुदेवाची भक्ति फार जुनी दिसत आहे. यदुवंशांतील वासुदेव व बलदेव यांना त्यांच्या पश्चात् लवकरच अवतार मानूं लागले असावेत. वासुदेव व संकर्षण व त्यांनी स्थापिलेला भागवतधर्म यांचा उल्लेख ख्रिस्ती शकापूर्वी २०० वर्षापूर्वीच्या शिलालेखांत आहे. तसेंच मौर्य घराण्याचा पहिला राजा चंद्रगुप्त याच्या कारकिर्दीत मेगास्थेनीस म्हणून एक मॅसिडोनियाचा वकील चंद्रगुप्ताच्या दरबारी आला होता. त्यानें मथुरा व यमुना यांचा व भागवतधर्माचा आपल्या ग्रंथांत उल्लेख केला आहे. भागवत हा धर्म सातवत या लोकांमध्ये प्रचलित होता. हा एकेश्वरी धर्म असून भक्ति किंवा देवावर अनन्यभावेंकरून प्रेम करणें, हे या धर्माचें मुख्य अंग होते. या धर्माला यज्ञ करणें व यज्ञामध्यें पशु मारणें पसंत नव्हतें. हाच धर्म शांतिपर्वात नारायणीय प्रकरणांत नारायणानें वसुउपचार या राजाला प्रथम सांगितला, असें म्हटलें आहे. पुढे वासुदेव व नारायण हे एकच आहेत व ते देवाधिदेव आहेत, असा समज झाला. वासुदेव हा विष्णूचा अवतार होय, असें लोक मानावयास लागले. यावरून ख्रिस्ती शकाच्या ४०० वर्षापूर्वीपासूनचा हा भागवतधर्म आहे, असें दिसतें. वासुदेवाला कृष्ण हें नांव पुढे मिळालें. कृष्ण हे गोत्राचें नांव असतें, व त्यावरून कृर्ष्यायन असा त्या गोत्रांतला अशा अर्थी शब्द झाला. कृष्ण हें ऋग्वेदांतील मंत्रद्रष्ट्या ऋषीचें नांव आहे. तो अंगिरस गोत्रापैकीं होता. पुढे वासुदेवाला कृष्ण म्हणूं लागले असावे. तेव्हां या देवाचें नांव वासुदेव-कृष्ण असें झालें. हा धर्म बौद्धधर्माइतकाच<noinclude>{{right|[ १०३ }}</noinclude>
64z3i3l6tht0uss4r2yk3e8612rkglo
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११७
104
110503
230539
2026-05-30T12:11:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230539
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>जुना आहे, असें म्हणावयास हरकत नाहीं. ख्रिस्ती शकानंतर अभीर म्हणून एक जातीचे लोक हिंदुस्थानांत आले.<ref>अभीर हे ख्रिस्ती शकापूर्वीच हिंदुस्थानांत आले असावेत, असे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'इंडियन अँटिक्वेरी'च्या अंकांतील एका लेखांत दाखविण्यांत आलें आहे व मनुस्मृतीतही अभीरांचा उल्लेख आहे. त्यावरून हे विधान खरे ठरतें. तरी पण या दाखल्यानें डॉ० भांडारकर यांचा मुख्य मुद्दा जो कृष्णकथेंत दोन कथांची भेसळ आहे, हा खोटा ठरत नाहीं. त्याचा काळ ख्रिस्ती शकाच्या पूर्वी येतो इतकेच.</ref> हे गोपाळवृत्ति लोक होते. हे गुरेढोरे ठेवून नेहमीं चारा मिळेल तिकडे फिरत असत. अजूनही उत्तर- हिंदुस्थानांत अहीर नांवाने हे प्रसिद्ध आहेत. या लोकांनी गवळ्याच्या लहान बालदेवाच्या दैवी पराक्रमाची एकादी गोष्ट आपल्याबरोबर आणली असावी, व अभीर लोकांचा मथुरेस व इतरत्र प्रसार झाल्यावर व त्यांना राजकीय वर्चस्व आल्यावर मूळचा वासुदेवकृष्ण व हा अभिरांचा गोपालकृष्ण व त्याचा गोपींशीं झालेला व्यवहार, या गोष्टींची भेसळ होऊन हल्लींचे उपलब्ध कृष्णचरित्र बनलेले असावें, असें डॉक्टर भांडरकरांचे म्हणणे आहे.
{{gap}}ही कल्पना युक्तीला पुष्कळ पटते, असे म्हटल्यावांचून राहवत नाहीं. दोन निरनिराळ्या रंगांच्या नदीच्या ओघांचा एक जीव झाला, तरी ज्याप्रमाणे सूक्ष्म दृष्टीने पाहणारास प्रवाहांतील रंगभेद दिसून येतो, त्याप्रमाणें श्रीकृष्णाची गोष्ट जरी आतां एकजीव झालेली दिसते, तरी त्या गोष्टीमध्ये सूक्ष्म तऱ्हेने पाहिल्यास दोन परस्पर भिन्न गोष्टींचा मिलाफ दिसल्याखेरीज रहात नाहीं. डॉक्टर भांडारकरांची ही कल्पना जरी पूर्णपणे सिद्ध झाली आहे, असे म्हणतां येणार नाहीं, तरी तिचा शांतपणे विचार करण्यासारखी तरी ती आहे, यांत शंका नाहीं. निदान माझ्या मनाला तरी ती पटली, असे मला कबूल करणें भाग आहे. जरी याप्रमाणे भागवतधर्म बुद्धकालीन असला, तरी गोपालकृष्णाची गोष्ट त्यांत मागून शिरली असावी. बौद्धधर्माला राजाश्रय मिळून त्याचा झपाट्यानें सर्व हिंदु-<noinclude>
{{reflist}}

{{gap}}१०४ ]</noinclude>
01zjp241ric8yzz4t9fvnvznqh839oj
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११८
104
110504
230540
2026-05-30T12:16:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230540
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''वैष्णवपंथ.'''}}</noinclude>स्थानभर प्रसार झाला. परंतु हा राजाश्रय कमी होतांच हिंदुधर्मानें पुन्हां डोके वर काढले. परंतु तो हिंदुधर्म यज्ञयागादिकांचा वैदिकधर्म नव्हे, तर भगवद्गीतेंत सांगितलेला भागवतधर्म होय. याचा उत्तरेकडून हळू हळू दक्षिणेत प्रवेश होत गेला, व बौद्धधर्मास उतरती कळा लागल्यानंतर दक्षिणेत जे मोठमोठे धर्मप्रवर्तक झाले, त्यांनीं या भागवताचा पुन्हां सर्व हिंदुस्थानभर प्रसार केला. या धर्मप्रसारकांपैकीं शंकराचार्य हे पहिले होत. परंतु हे विशेषतः ज्ञानमार्गी होते. त्यांनीं मायावाद व अद्वैतमत प्रतिपादिल्यामुळे भक्तीच्या भागवतधर्माला त्यांच्याकडून फारसे प्रोत्साहन मिळाले नाहीं. असें प्रोत्साहन रामानुजाचार्यांकडून मिळाले. यांचा जन्म १०१७ मध्ये झाला व यांनीं भक्तिमार्ग अथवा भागवतधर्माचा प्रसार केला. परंतु यांच्या धर्मामध्यें विष्णु या नांवानेंच परमेश्वराचा उल्लेख येतो. कृष्ण व विष्णु एकच असेंही ते म्हणत. परंतु यांच्या उपदेशांत अजून राधाकृष्णाचें नांवही दिसून येत नाहीं. मथुरेतील दोघां श्रीमान् शेटजींनी या पंथाचा स्वीकार करून वृंदावनास छत्तीस लाख रुपये खर्चून श्रीरंगजीचें देऊळ बांधल्यापासून या पंथाचे कांहीं लोक मथुरेंत झाले, व हा एक कृष्णभक्तीचाच पंथ आहे, असें मानण्यांत येऊ लागलें. मध्वाचार्य हे ११९९ मध्ये जन्मले यांनी द्वैतमताचा प्रसार करून कृष्ण व विष्णूची भक्ति करणें हेंच खरें मोक्षाचे साधन आहे, असें प्रतिपादन केलें, व त्यांनीं मथुरा व वृंदावन या ठिकाणांस जास्त पावित्र्य व महत्त्व आणले; तरी पण गोकुळांतील राधाकृष्णांच्या कथेवर त्यांचा भर नसे.
{{gap}}गोकुळांतील राधाकृष्ण व विशेषतः राधेची व गोपींची भक्ति करणें व कृष्णाप्रमाणें गोपींशीं लीला करणें हेंच मोक्षाचें साधन आहे, अशा प्रकारच्या धर्माचा प्रचार निंबार्क, वल्लभाचार्य व चैतन्य या अर्वाचीन धर्मप्रवर्तकांनी केला व हल्लीं मथुरेंत व वृंदावनांत याच पंथाच्या लोकांचा फार भरणा आहे.
{{gap}}निंबार्काचें मूळचें नांव भास्कराचार्य असें होतें. यानें एकदां एका साधुपुरुषाला सायंकाळीं भोजनास बोलाविलें. परंतु त्या पुरुषास सूर्य मावळल्यावर भोजन करावयाचें नाहीं, हें विसरून त्यानें त्याला बोलाव-<noinclude>{{right|[ १०५ }}</noinclude>
e4oqo07em4zm1uhc54mqbjfg345d23s
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/११९
104
110505
230541
2026-05-30T12:20:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230541
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>ण्यास उशीर केला. परंतु सूर्यनारायण भास्कराचार्यावर उपकार करण्याकरितां निंब झाडावर उतरला व भोजन आटोपेपर्यंत तेथे थांबला. म्हणून त्याला निंबार्क म्हणूं लागले, अशी एक दंतकथा या पंथाच्या उत्पादकाविषयीं सांगतात! हा निंबार्क मथुरा वृंदावनास पुष्कळ दिवस होता. राधाकृष्णाची भक्ति करणें, नंद व यशोदा यांप्रमाणे त्यावर प्रेम करणें, गोपालकृष्णाची सेवा करणें, व त्याला आपले सर्वस्व अर्पण करणें हेंच मोक्षाचें खरें साधन, असें त्यानें शिकविलें.
{{gap}}वल्लभाचार्य यांचा पंथ फारच मोठा आहे. वल्लभ हा लक्ष्मण भट्ट या नांवाच्या तेलगू ब्राह्मणाचा मुलगा होता. याचा जन्म १४७९ मध्ये झाला. हा वृंदावनांत रहात असतां श्रीनाथजीनें त्याच्या स्वप्नांत येऊन असे सांगितलें कीं, "माझें देऊळ तूं बांध व माझ्या भक्तीच्या धर्माचा प्रसार कर." त्याप्रमाणें वल्लभानें वृंदावनास श्रीनाथजीचें देऊळ बांधून वल्लभपंथाचा प्रसार केला. या पंथाच्या मताप्रमाणे कृष्ण हाच खरोखरी परमात्मा आहे व या कृष्णपरमात्म्याबरोबर क्रीडा करण्यास मिळणे हाच खरा मोक्ष आहे. जे कृष्णाची भक्ति करतात त्यांनाच कृष्ण आपल्या सहवासांत व आपल्या खेळांत घेतो. ही भक्ति ईश्वरच मनुष्याच्या मनांत उत्पन्न करतो. प्रथमतः मनुष्याच्या मनांत ईश्वराविषयीं आवड उत्पन्न होते. यामुळें मनुष्य ईश्वराविषयीं ज्ञान मिळवूं लागतो. यालाच प्रेमभक्ति म्हणतात. हिची पहिली पायरी प्रेम होय; दुसरी पायरी आसक्ति होय; तिसरी पायरी व्यसन होय. या व्यसनानें मनुष्याला परमेश्वर जिकडे तिकडे दिसूं लागतो. अशी अवस्था प्राप्त झाली म्हणजे कृष्णपरमात्मा या भक्ताला आपल्या खेळांत निरनिराळ्या स्वरूपांत घेतो, व ही स्थिति धर्मार्थकाममोक्ष या चाऱ्ही अर्थापेक्षां श्रेष्ठतर आहे. कृष्णानें गोपींशीं ज्याप्रकारें क्रीडा केली त्याच तऱ्हेची या भक्तांशी त्याची क्रीडा होते व या क्रीडेमध्ये सामील होणें हेंच प्राण्याचें इतिकर्तव्य आहे. ही भक्ति उत्पन्न होण्यास वल्लभानें सांगितलेला मार्ग म्हणजे श्रीकृष्णाची व वल्लभाचार्याची पूजाअर्चा करणे हा होय. मनुष्यानें प्रातःकाळी उठावें, भागवत हें नांव उच्चारावें, व प्रातर्विधि करून देवाच्या<noinclude>
{{gap}}१०६ ]</noinclude>
8oqej2fv765kmsevpmfybbhuk1i2yxw
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१२०
104
110506
230542
2026-05-30T12:24:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230542
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|'''वैष्णवपंथ.'''}}</noinclude>पायांचे थोडे पाणी प्यावें, व मग पूर्वेस तोंड करून गुरूचें नांव घ्यावें; नंतर कृष्णाला नमस्कार करावा, नंतर यमुना व गोपी यांना वंदन करावें, कृष्णानें खाल्लेल्या तांदुळांचें सेवन करावें व स्नान वगैरे करून व चंदन अंगाला लावून मग देवळाचें दार उघडून देवाच्या शय्येवरील माला वगैरे बाहेर आणून त्याची निजावयाची खोली साफ करावी, मग एक गाणें म्हणून कृष्णाला उठवावें, नंतर राधाकृष्णाला नमस्कार करून त्यांना स्नान वगैरे घालून त्यांना नैवेद्य दाखवावा, मग पुन्हां कृष्णाला पाळण्यांत घालून निजवावा, नंतर दोन प्रहरचे जेवण आणावें. याप्रमाणें देवाचे सर्व विधि लहान मुलाप्रमाणे करावयाचे, हीच देवाची पूजा व भक्ति. या पंथामध्ये विषयविरोधाचा उपदेश कमीच आहे. उलट विलासांतच मोक्ष आहे, अशा प्रकारची कल्पना या पंथाच्या उपासनाक्रमांत आहे, व आम्हीं मागें मथुरेच्या वर्णनांत देवाची याचप्रमाणे पूजाअर्चा चालते, व भाविक लोक हे सर्व विधि अंधश्रद्धेने अजूनही करतांना दिसतात याचें वर्णन दिलेच आहे.
{{gap}}वल्लभाच्याच सुमारास बंगाल्यांत चैतन्य उदयास आला. याचा जन्म १४८७ मध्ये झाला. याचा लहानपणीच विवाह झाला होता. पुढे मोठेपणी यानें संन्यासाश्रम स्वीकारला व आपल्या पंथाचा प्रसार केला. वल्लभानें कृष्णभक्तीमध्यें विधि व बाह्य पूजा यांचे बंड माजविलें; चैतन्यानें भक्ति अंतरंग पाहिजे व ती भजनानें व कीर्तनानें उत्पन्न होत, असे प्रतिपादन केलें. दोघांचीही मोक्षाची कल्पना सारखीच होती. परलोकामध्यें श्रीकृष्णपरमात्म्याबरोबर खेळावयास मिळणे हाच खरा मोक्ष होय; असे दोन्ही पंथांचें मत आहे. चैतन्य पंथांत कृष्णाइतकाच किंबहुना एक कांकणभर मात्र जास्त मान राधेला आला. राधेची भक्ति करणें हेच मोक्षाचें साधन बनले.
{{gap}}या पंथांच्या वरील हकीकतीवरून गोपालकृष्णाची भक्ति ही गेल्या चार पांचशे वर्षांच्या आंतील आहे, हें स्पष्टपणे दिसून येईल. मथुरावृंदावन पाहणाराच्या हीच गोष्ट प्रथमतः मनांत येते. येथील सर्व प्रकार फार जुने भासत नाहीत. देवळें तर अगदी नव्यासारखी दिसतात. मथुरावृंदा-<noinclude>{{right|[ १०७ }}</noinclude>
487jnjh9grzdjx3e3rtsgyq7ikb050p
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१२१
104
110507
230543
2026-05-30T12:27:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230543
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>वनांत या चारी प्रकारच्या वैष्णवपंथांचे पुष्कळ लोक आहेत. इतर जातींचे व सामान्य हिंदुधर्मावर भरवसा ठेवणारेही पुष्कळ हिंदु आहेत.
{{gap}}हे मथुरावृंदावन- वर्णन फारच वाढलें. परंतु वाचकांना ही हकीकत वाचून कांहीं तरी करमणूक होईल, व आपल्या हिंदुधर्माच्या कित्येक पंथांचा किती लांबवर इतिहास पोचतो हे ध्यानांत येईल, म्हणून ही हकीकत थोड्या विस्तारानें दिली आहे.
{{gap}}संकल्प केल्याप्रमाणे माझ्या उत्तरहिंदुस्थानच्या प्रवासाच्या पडध्यायी पुराणाचा शेवट आला. या पुराणश्रवणाने वाचकांना प्रवासाची प्रबल इच्छा होऊन त्यांना आपल्या देशांतील निसर्ग रमणीय व धर्म-पुनीत स्थानांचे दर्शन घडो, अशी इच्छा करून वाचकांची रजा घेतो.

{{center|{{xx-larger|'''संपूर्ण'''}}}}

<noinclude>
{{gap}}१०८ ]</noinclude>
iwdpkwddkm2mjowke6dh1fet2pkiehv
230545
230543
2026-05-30T12:35:28Z
कल्पनाशक्ती
3813
230545
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />'''प्रवास-वर्णन.'''</noinclude>वनांत या चारी प्रकारच्या वैष्णवपंथांचे पुष्कळ लोक आहेत. इतर जातींचे व सामान्य हिंदुधर्मावर भरवसा ठेवणारेही पुष्कळ हिंदु आहेत.
{{gap}}हे मथुरावृंदावन- वर्णन फारच वाढलें. परंतु वाचकांना ही हकीकत वाचून कांहीं तरी करमणूक होईल, व आपल्या हिंदुधर्माच्या कित्येक पंथांचा किती लांबवर इतिहास पोचतो हे ध्यानांत येईल, म्हणून ही हकीकत थोड्या विस्तारानें दिली आहे.
{{gap}}संकल्प केल्याप्रमाणे माझ्या उत्तरहिंदुस्थानच्या प्रवासाच्या पडध्यायी पुराणाचा शेवट आला. या पुराणश्रवणाने वाचकांना प्रवासाची प्रबल इच्छा होऊन त्यांना आपल्या देशांतील निसर्ग रमणीय व धर्म-पुनीत स्थानांचे दर्शन घडो, अशी इच्छा करून वाचकांची रजा घेतो.

{{center|{{xx-larger|'''संपूर्ण'''}}}}

{{nop}}<noinclude>
{{gap}}१०८ ]</noinclude>
fxo8n3lm52qzkepey4z90quvuhqcdio
पान:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf/१२२
104
110508
230544
2026-05-30T12:34:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230544
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xx-larger|'''प्रि० गोविंद चिमणाजी भाटे xxxx'''}}
{{xxx-larger|'''विविधविषयांवरील पुस्तके'''}}}}
१ अर्थशास्त्राची मूलतत्त्वें.

२ समाजशास्त्रावरील व्याख्यानें.

३ सज्जनगड व समर्थ रामदास.

४ माझा उत्तर हिंदुस्थानचा प्रवास. (सचित्र)
५ माझा अटकेपार प्रवास. (सचित्र)
६ हिंदुस्थानचे नंदनवन. (सचित्र)
७ नं. ४, ५ व ६ यांची उत्तम कापडी बाइंडिंगची वाचनालय आवृत्ति.
{{center|{{x-larger|लवकरच छापून होणारी पुस्तx}}}}
१ कार्लाईल व हिंदु वालीरीति.

२ चरित्रपंचक (सचित्र)

३ सामाजिक सुधारणेची मूलतत्त्वें.
{{center|{{x-larger|आर. आर. आणि मंडळी, पटवर्धनांचxxxxxx}}}}
{{rule|5em}}
{{center|{{xx-larger|'''रा० भि० जोशीकृत पुस्तxx'''}}}}
१ मराठी भाषेची घटना.

२ प्रौढबोध व्याकरण.

३ मराठी शब्दसिद्धी.

४ सुलभ अलंकार.

{{center|प्रि० भाटेकृत नं. ४ 'माझा उत्तरहिंदुस्थानचा प्रxxxxxxxxxxx
ह्याची मागणी प्रकाशकाकडेच करावxxxxxxxxxxx
वरील सर्व पुस्तकें खालच्या पत्यावरxxxxxxxxxxx
'''मा० रा० जोशी,'''xxxxxxxxxxx

६, नारायण}}<noinclude></noinclude>
d01mqg83836a456tm1x0m0abhat1ogu
पान:वाक्यमीमांसा आणि वाक्यांचें पृथक्करण.pdf/३
104
110509
230546
2026-05-31T04:53:20Z
~2026-32174-26
6049
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "पुणें येथें “ आयैबिंजय ” छळापखान्यांत छापून प्रसिद्ध केले."
230546
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="2401:4900:1C42:4648:21EB:58B0:CC28:6A9E" /></noinclude>पुणें येथें “ आयैबिंजय ” छळापखान्यांत छापून प्रसिद्ध केले.<noinclude></noinclude>
0bw2u03foojss0082hagv5prsiy5j84
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
0
110510
230548
2026-05-31T06:34:16Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]] | वर..."
230548
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="1" to="5 " />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
8im1qemv9wly5nt6iz3gs49u4ueovg0
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल
0
110511
230549
2026-05-31T06:35:32Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]] | पुढील = माझ..."
230549
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर|ग्वालेर.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="6" to="28 " />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
bh4jmdhxdo5w3pw6ebstxb5x5h970no
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर
0
110512
230550
2026-05-31T06:36:57Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]] | पुढील = माझ..."
230550
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/नैनिताल|नैनिताल.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार|हरिद्वार किंवा गंगाद्वार.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="29" to="47 " />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
8vaavr3pj3b6o81ivdv4s785s6c8aov
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार
0
110513
230551
2026-05-31T06:38:33Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर|ग्वालेर.]] | पुढील = माझ..."
230551
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/ग्वालेर|ग्वालेर.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल|गुरुकुल.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="48" to="64" />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
dedhga7xtuubnadg314rny391966vda
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल
0
110514
230552
2026-05-31T06:39:59Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार|हरिद्..."
230552
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/हरिद्वार किंवा गंगाद्वार|हरिद्वार किंवा गंगाद्वार.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन|मथुरावृंदावन.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="65" to="84" />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
hj8xhosl8qvc0ljcqlq6249z5ek5clg
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन
0
110515
230553
2026-05-31T06:41:19Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल|गुरुकुल.]] | पुढील = माझ..."
230553
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/गुरुकुल|गुरुकुल.]]
| पुढील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/कृष्णकथा व वैष्णवपंथ|कृष्णकथा व वैष्णवपंथ.]]
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="85" to="102" />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
m1sxt927geqhukqgl25qzxhoukfstta
माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/कृष्णकथा व वैष्णवपंथ
0
110516
230554
2026-05-31T06:42:22Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास | साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे | अनुवादक = | विभाग = | मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन|मथुरावृंदावन.]] | प..."
230554
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास
| साहित्यिक = गोविंद चिमणाजी भाटे
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास/मथुरावृंदावन|मथुरावृंदावन.]]
| पुढील =
| वर्ष = 1920
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास.pdf" from="103" to="122" />
[[वर्ग:माझा उत्तरहिंदुस्तानचा प्रवास]]
7mh0cp9sdu0f2qwms6ismbhcbnmn64f