विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.5
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९८
104
85862
230634
182055
2026-06-03T04:50:12Z
JayashreeVI
4058
230634
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९३}}
{{rule}}</noinclude>च्या हकीकतीशीं जुळतें. यावरून ती हकीकत त्या बखरींतून उतरून घेतली असावी असे वाटतें. पुढें सज्जनगडीं राहण्यास येण्याबद्दल शिवाजीनें रामदासांस विनंति केली, व त्यावेळी रामदासांनीं शिवाजीस नीतीचा
उपदेश केला यासंबंधाचें पाल्हाळानें वर्णन केले आहे. आणखीही दोन ठिकाणी रामदासांचे उल्लेख आले आहेत.

{{gap}}चिटणिसांच्या बखरींत मात्र रामदासाबद्दल बराच मजकूर आहे. शिवाजी व रामदास यांचा गुरु-शिष्यपणाचा संबंध होता व शिवाजीमहाराज रामदासांस केव्हां केव्हां सल्ला मसलत विचारीत असत असे म्हटले आहे. पण याचा उलगडा सहज होतो. मल्हार रामराव चिटणीस मराठीशाहीचे प्रसिद्ध बखरकार हे
रामदासस्वामींची बखर करणारे हनुमानस्वामी यांचे समकालीन होते इतकेंच नव्हे तर हनुमानस्वामींनी चिटणिसांची मदत रामदासांची बखर लिहितांना घेतली होती असे हनुमानस्वामींच्या बखरींच्या उपलब्ध प्रतींची हकीकत देतांना सत्कार्योत्तेजक सभेच्या मासिकांत कबूल केले आहे. या वरून इतकें होतें कीं, रामदासांची शिष्यपरंपरागत हकीकत आतां समाजांत बरीच प्रचलित झाली होती. तरी पण मराठीतील ऐतिहासिक बखरकाराला शोभेल अशा त-हेची चिकित्सक बुद्धि थोड्या तरी प्रमाणांत चिटणीस यांनी दाखविलेली आहे. कारण रामदासांच्या बखरींत असलेल्या सर्वच दंतकथांना चिटणीसांनीं शिवाजीच्या बखरींत जागा दिली नाहीं. शिवाजीनें राज्यस्थापनेला प्रारंभ १६४० मध्ये केला व त्याच्या मनांत राजकीय महत्वाकांक्षेच्या कल्पना दहाबारा वर्षीपासून येऊ लागल्या होत्या असे सांगितले आहे.

{{gap}}पुढें रामदासांची कुळकथा सांगून शिवाजीची व रामदासांची भेट व रामदासांनीं शिवाजीला केलेल्या अनुग्रहाचें वर्णन हनुमानस्वामींच्या बखरी इतक्या पाल्हाळानें नसले तरी त्यांतल्या प्रमाणे केले आहे.

{{gap}}नंतर शिवाजीनें दिल्लीस जाण्यापूर्वी रामदासांचें दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला होता असे सांगितले आहे.

{{gap}}शिवाजीनें आपल्याला राज्याभिषेक करवून घेण्याचा निश्चय केल्यानंतर--<noinclude></noinclude>
fko1zeodroxvechqsz34g3t9bw3d9rx
230635
230634
2026-06-03T04:50:39Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230635
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९३}}

mn9v8tkh4cl8fz2xn25ayf2kiv5hntl
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९९
104
85863
230644
182056
2026-06-03T11:22:09Z
JayashreeVI
4058
230644
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|९४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>महाराष्ट्रांतील मोरया देव व इतर साधुसंत यांची ज्याप्रमाणें या बाबतींत अनुमति घेतली त्याप्रमाणें रामदासांचीहि घेतली होती असें वर्णन केले आहे.

{{gap}}१६७८ मध्ये शिवाजी रामदासास भेटावयास गेले होते. तेव्हां रामदासांनी महाराजांस लोक जो 'जोहार' करतात त्या ऐवज 'राम राम म्हणत जावें असें म्हटलें. तेव्हांपासून रामरामाची पद्धति सुरू झाली. याच प्रसंगी शिवाजीनें रामदासांस परळी किल्ल्यावर रहाण्यास येण्यास विनंति केली. त्या वेळी रामदासांनीं चाफळचे रामजीचे उत्साहाचा बंदोबस्त करावा असें शिवाजीस सांगितले व त्यानें चाफळच्या मठास गांव इनाम
करून दिलें.

{{gap}}इतक्याच दोन तीन प्रसंगाचें चिटणिसांनी आपल्या बखरींत वर्णन केले आहे. हनुमान स्वामीच्या बखरींत रामदास शिवाजीच्या विनंतीवरून १६५० मध्यें परळीस राहावयास गेले असे वर्णन आहे. अर्थात् हे विधान
ऐतिहासिकदृष्टया खोटें (कारण शिवाजीच्या सर्व बखरींप्रमाणें परळी किल्ला चंदनवंदन व साताऱ्या किल्याबरोबरच १६७३ मध्ये शिवाजीच्या ताब्यात आला) म्हणून चिटणीसानीं आपल्या बखरींतून वगळले आहे व ऐतिहासिक गोष्टींशी जुळे अशा तऱ्हेनेंच रामदासांच्या सज्जनगडनिवासाची हकीकत दिली आहे.

{{gap}}अफजूलखानाच्या वधानंतर शिवाजीमहाराज रामदासांस परळीस भेटावयास गेले व त्या वेळी त्यांनीं कांहीं गांव इनाम करून दिले ही आख्यायिका; त्याचप्रमाणें शिवाजीनें रामदासांस राज्यदान केल्याची आख्यायिका या विश्वसनीय नाहीत म्हणून चिटणिसांना सोडून दिल्या असाव्यात. यावरून चिटणिसांनीं शिवाजीची बखर लिहितांना बरीच ऐतिहासिक दृष्टि ठेविली होती असे दिसतें. अर्थात् अशी दृष्टि आपल्या आराध्य दैवताचें देव्हारें माजविण्याकरितां लिहिलेल्या हनुमानस्वामींच्या बखरींत नाहीं हे उघड आहे. त्यांतील किती तरी गोष्टी अशक्य असंभाव्य व ऐतिहासिक सत्यास न जुळणाऱ्या अशा आहेत. त्यांची येथें चर्चा करण्याचें प्रयोजन नाहीं. पण त्या गोष्टी रामदासांचें महत्त्व वाढविण्याकरितां--<noinclude></noinclude>
0we69ly8thwlivhmuuwihkxomv308wp
230645
230644
2026-06-03T11:22:38Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230645
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|९४|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}

kgyg1h4hb0ef6d03bz7sop7uc95axth
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१००
104
85864
230649
182058
2026-06-03T11:34:48Z
JayashreeVI
4058
230649
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९५}}
{{rule}}</noinclude>बनावट केलेल्या आहेत व शिवाजीच्या चरित्रांतील गोष्टी समाजांत प्रचलित झाल्यानंतर त्यांना जुळतील अशा तऱ्हेनें त्या बनविलेल्या आहेत हे मागें दिलेल्या रामदासांनीं भवानी देवीस शिवाजीच्या अंगांत येण्यास सांगितल्याबद्दलच्या आख्यायिकेच्या खालील विवेचनावरून दिसून येईल.

{{gap}}शिवाजीवर भवानी देवीची कृपादृष्टि होती व बिकट प्रसंगी ती शिवाजीच्या अंगांत येऊन त्याला सल्लामसलत देत असे व शिवाजी तदनुरूप वर्तन करीत असे ही गोष्ट शिवाजीच्या आयुष्यांतील एक अलौकिक गोष्ट होती. तिचें वर्णन शिवाजीच्या सर्व बखरकारांनी सारख्याच तऱ्हेनें केलेले आहे. ही शिवाजी बद्दलची गोष्टः शिवाजीच्या काळापासून समाजांत प्रचलित असावी. शिवाजीचा व रामदासस्वामींचा गुरुशिष्यसंबंध होता व त्या संबंधाप्रमाणें शिवाजी रामदासांस सर्व बाबतीत सल्लामसलत विचारी व त्यांची आज्ञा पाळी अशा प्रकारची दंतकथा रामदासांच्या पंथांत प्रचलित झाली किंवा प्रचलित केली गेली; तेव्हां शिवाजीच्या आयुष्यांतील भवानीच्या आख्यायिकेशीं तिचा विरोध येऊं लागला. बरें जनमनांत मुरलेली भवानीच्याबद्दलची आख्यायिका बदलणे शक्य नव्हते. तेव्हां या जुन्या आख्यायिकेला बाध न येई अशा तऱ्हेनेंच रामदासांना महत्त्व देणारी आख्यायिका
रचण्यांत आली असे म्हणणें प्राप्त आहे. कारण अशी कल्पना करा की शिवाजीच्या आयुष्यांत अशी आख्यायिका नव्हती व शिवाजीची निस्सीम शिष्यभक्ति व रामदासांचें महत्त्व दाखविण्याकरितांच ही आख्यायिका रचावयाची असती तर ती खालीलप्रमाणें रचणें स्वाभाविक व कल्पकतेला अनुरूप होतें.

{{gap}}शिवाजीचा निश्चय कीं, स्वामींची आज्ञा झाल्याखेरीज कोणतेंहि काम सर्वथैव कर्तव्य नाहीं. गलीम लढाई करून आला असें तर संकट प्राप्त झालें. शिवाजी तर कारभा-याचें ऐकेना; तेव्हां रामदास एकदम प्रगट होऊन शिवाजीस म्हणाले, " तूं हा राज्यकारभार करतोस, यांत कोणेंसमयी कसा प्रसंग येईल याचा नेम नाहीं. आम्हीं तर तुम्हांपाशीं सतत नसणार व तुमचा नेम तर असा आहे; तो चालणार नाहीं. या करितां जसा प्रसंग येईल तशी मसलत करून काम करीत असावें.” यावर शिवाजी--<noinclude></noinclude>
hb0px2kyw0akas174i3cbdjuc9dw3c7
230650
230649
2026-06-03T11:35:18Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230650
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९५}}

imask4z4bgxue7ovifw1koehtmndejl
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०१
104
85865
230651
182059
2026-06-03T11:45:05Z
JayashreeVI
4058
230651
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh| |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>महाराज बोलले कीं प्राण जावो अथवा राहो दौलतीचा तो विषय किती आज्ञेवांचून पाऊल हीं पुढें पडावयाचें नाहीं.

{{gap}}शिवाजीचा याप्रमाणें निश्चय पाहून रामदासांनी म्हटलें, "माझें परम दैवत राम किंवा हनुमान हा तुझ्या अंगांत येऊन तुझ्या अडचणीच्या प्रसंगी तुला सल्लामसलत देईल ती माझीच आज्ञा समजून तूं तदनुरूप
वर्तन कर."

{{gap}}स्वतंत्रपणे आख्यायिका रचावयाची असती तर ती अशा तऱ्हेची नसती काय? या आख्यायिकेंत शिवाजीची शिष्यभक्ति व रामदासांची महती दिसून आली नसती काय? शिवाय बखरींप्रमाणे पहातां रामदासांला आपल्या आराध्य दैवताचा फार अभिमान असे, इतका कीं तो पंढरपुर/ सारख्या तीर्थास राम नाहीं म्हणून कित्येक काळपर्यंत गेला नाहीं.. या एकाच गोष्टींत रामदासांस भवानी देवीचाच उमाळा कां आला तर याचा अर्थ इतकाच कीं शिवाजीच्या जुन्या आख्यायिकेस टाकून देणें शक्य नव्हतं म्हणून त्या आख्यायिकेला धरून ही रामदासांच्या महत्त्वाबद्दलची आख्यायिका रचावी लागली. असो.

{{gap}}वरील विवेचनावरून हनुमानस्वामींची बखर ऐतिहासिकदृष्ट्या ग्राह्य नाहीं; ती व्रतमाहात्म्य किंवा देवतामाहात्म्य याप्रमाणें दंतकथांनी व भाकडकथानीं भरलेली आहे. तेव्हां अवांतर ऐतिहासिक पुराव्यावांचून त्यांतील हकीकतीवर विश्वास ठेवणें रास्त नाहीं हें उघड आहे. तरी शिवाजीचा व रामदासांचा संबंध खरोखरी कशा प्रकारचा होता व तो केव्हांपासून घडून आला या वादग्रस्त प्रश्नाचा ऐतिहासिकदृष्ट्या आतां ऊहापोह करूं.
{{center|___________}}<noinclude></noinclude>
hididne6rxzdmrm6ncoplhceh66tbvv
230652
230651
2026-06-03T11:46:12Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230652
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|९६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>महाराज बोलले कीं प्राण जावो अथवा राहो दौलतीचा तो विषय किती आज्ञेवांचून पाऊल हीं पुढें पडावयाचें नाहीं.

{{gap}}शिवाजीचा याप्रमाणें निश्चय पाहून रामदासांनी म्हटलें, "माझें परम दैवत राम किंवा हनुमान हा तुझ्या अंगांत येऊन तुझ्या अडचणीच्या प्रसंगी तुला सल्लामसलत देईल ती माझीच आज्ञा समजून तूं तदनुरूप
वर्तन कर."

{{gap}}स्वतंत्रपणे आख्यायिका रचावयाची असती तर ती अशा तऱ्हेची नसती काय? या आख्यायिकेंत शिवाजीची शिष्यभक्ति व रामदासांची महती दिसून आली नसती काय? शिवाय बखरींप्रमाणे पहातां रामदासांला आपल्या आराध्य दैवताचा फार अभिमान असे, इतका कीं तो पंढरपुर/ सारख्या तीर्थास राम नाहीं म्हणून कित्येक काळपर्यंत गेला नाहीं.. या एकाच गोष्टींत रामदासांस भवानी देवीचाच उमाळा कां आला तर याचा अर्थ इतकाच कीं शिवाजीच्या जुन्या आख्यायिकेस टाकून देणें शक्य नव्हतं म्हणून त्या आख्यायिकेला धरून ही रामदासांच्या महत्त्वाबद्दलची आख्यायिका रचावी लागली. असो.

{{gap}}वरील विवेचनावरून हनुमानस्वामींची बखर ऐतिहासिकदृष्ट्या ग्राह्य नाहीं; ती व्रतमाहात्म्य किंवा देवतामाहात्म्य याप्रमाणें दंतकथांनी व भाकडकथानीं भरलेली आहे. तेव्हां अवांतर ऐतिहासिक पुराव्यावांचून त्यांतील हकीकतीवर विश्वास ठेवणें रास्त नाहीं हें उघड आहे. तरी शिवाजीचा व रामदासांचा संबंध खरोखरी कशा प्रकारचा होता व तो केव्हांपासून घडून आला या वादग्रस्त प्रश्नाचा ऐतिहासिकदृष्ट्या आतां ऊहापोह करूं.
{{center|___________}}<noinclude></noinclude>
otdq4zbfifkp87iqn71dgw0nu5l7mjz
अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf
106
104084
230642
230628
2026-06-03T10:19:32Z
कल्पनाशक्ती
3813
230642
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
owm51mndfg7ycuk9wfpmvnzm6s5kne7
अनुक्रमणिका चर्चा:Samagra Phule.pdf
107
110528
230636
230591
2026-06-03T06:19:12Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे */ Reply
230636
wikitext
text/x-wiki
== ह्या पुस्तकाच्या फाइलचे नाव बदलणे ==
@[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]],
फाइलचे नाव हे कोणत्याही वाचकास कधीच दिसत नाही ते कोणत्याही भाषेत असेल तर त्याने कोणतीही अडचण येत नाही.
मी अनेकदा विरोध करुनही आपण पुन्हा पुन्हा, फाइलचे नाव मराठीत हवे असा आग्रह धरता आणि तसे करता सुद्धा, त्यामुळे अनेकानी केलेले काम पुढे नेण्यास अडचणी येतात. आता ह्या पानांचे झालेले ओसीआर उपयोगात आणणे शक्य नाही कारण मुळ फाईलचे नाव बदलले आहे. [[Special:Diff/1022996291]] येथे तुम्ही फाइलचे नाव बदलुन घेतले आणि आता ह्या अनुक्रमाणिकेवर मी केलेले काम पुढे नेणे अशक्य आहे. .
काय करावे ते सुचवा आणि कृपा करुन असे नाव पुन्हा बदलु नका, किमान कुणाला तरी विचारात घ्या. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:०३, १ जून २०२६ (IST)
:होय, आपले म्हणणे योग्य आहे. मी येथे झालेले काम न तपासता नाव बदलण्याची विनंती केली. क्षमस्व. येथील काम सुसूत्रपणे करण्यासाठी पुन्हा नाव पूर्ववत करण्यासाठी विनंती करावी असे वाटते. आपले मत द्यावे. [[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) ११:४९, ३ जून २०२६ (IST)
ec3ovlgvqs7an00xu03i0de2u3138xc
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१२
104
110535
230637
230629
2026-06-03T09:09:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230637
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xxx-larger|'''काशी - रामेश्वर यात्रा'''}}}}
{{rule|11em}}
{{center|{{x-larger|'''प्रकरण १ लें'''}}}}
{{rule|7em}}
{{center|'''यात्रामार्ग व यात्राकाल.'''}}
{{x-larger|'''मी'''}} केव्हांही मोठा भाविक हिंदु नव्हतों व नाहीं. तरी पण भाविक हिंदूच्या प्रमाणें माझ्या बहुतेक यात्रा झाल्या आहेत, इतकेंच नाही तर त्या कधीं कधीं यथासांग व यथाक्रम झाल्या आहेत. जिचें वर्णन या पुस्तकांत देण्याचा विचार आहे त्या काशीरामेश्वर यात्रेचीच गोष्ट घ्याना. जुन्या पद्धतीप्रमाणें यथासांग काशीरामेश्वर यात्रा करावयाची म्हटली म्हणजे ती दिडकी यात्रा होते. कारण आपल्या प्रांतांतला मनुष्य प्रथम काशीस जातो. तेथली गंगा घेऊन तो सेतु रामेश्वरीं नेऊन टाकतो व तेथला सेतु (सेतु रामेश्वरच्या समुद्र-संगमाच्या ठिकाणची वाळू) घेऊन परत काशीस जाऊन तो सेतू गंगेंत टाकतो म्हणजे यथासांग काशीरामैश्वर यात्रा झाली असा समज आहे. अर्थात् या यथासांग यात्रेत काशीस दोनदां जाणें पडतें व रामेश्वरास एकदां जाणें पडतें. माझी काशी रामेश्वराची यात्रा थेट या क्रमानें झाली. मात्र अशी यथासांग यात्रा मीं पुण्यप्राप्तीकरितां केली नाहीं हें मला प्रांजलपणें कबूल केलें पाहिजे. माझ्या हातून ज्या सर्व यात्रा घडल्या त्या माझ्या प्रवासप्रियतेमुळें व माझ्या सृष्टिसौंदर्य- प्रेमामुळे घडल्या व म्हणूनच माझा यात्रामार्ग वाचकांस पुष्कळ वेळ वेडावाकडा वाटण्याचा संभव आहे. तेव्हां या उपोद्घातरूपी प्रकरणांत मी माझ्या काशीरामेश्वर यात्रा-मार्गाचे व यात्रा-कालाचें दिग्दर्शन करणार आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
4vcw8ycpnr9f7u6kw2mde0i1u1t0mf7
230643
230637
2026-06-03T10:22:04Z
कल्पनाशक्ती
3813
230643
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xxx-larger|'''काशी - रामेश्वर यात्रा'''}}}}
{{rule|11em}}
{{center|{{x-larger|'''प्रकरण १ लें'''}}}}
{{rule|7em}}
{{center|'''यात्रामार्ग व यात्राकाल.'''}}
{{gap}}{{x-larger|'''मी'''}} केव्हांही मोठा भाविक हिंदु नव्हतों व नाहीं. तरी पण भाविक हिंदूच्या प्रमाणें माझ्या बहुतेक यात्रा झाल्या आहेत, इतकेंच नाही तर त्या कधीं कधीं यथासांग व यथाक्रम झाल्या आहेत. जिचें वर्णन या पुस्तकांत देण्याचा विचार आहे त्या काशीरामेश्वर यात्रेचीच गोष्ट घ्याना. जुन्या पद्धतीप्रमाणें यथासांग काशीरामेश्वर यात्रा करावयाची म्हटली म्हणजे ती दिडकी यात्रा होते. कारण आपल्या प्रांतांतला मनुष्य प्रथम काशीस जातो. तेथली गंगा घेऊन तो सेतु रामेश्वरीं नेऊन टाकतो व तेथला सेतु (सेतु रामेश्वरच्या समुद्र-संगमाच्या ठिकाणची वाळू) घेऊन परत काशीस जाऊन तो सेतू गंगेंत टाकतो म्हणजे यथासांग काशीरामैश्वर यात्रा झाली असा समज आहे. अर्थात् या यथासांग यात्रेत काशीस दोनदां जाणें पडतें व रामेश्वरास एकदां जाणें पडतें. माझी काशी रामेश्वराची यात्रा थेट या क्रमानें झाली. मात्र अशी यथासांग यात्रा मीं पुण्यप्राप्तीकरितां केली नाहीं हें मला प्रांजलपणें कबूल केलें पाहिजे. माझ्या हातून ज्या सर्व यात्रा घडल्या त्या माझ्या प्रवासप्रियतेमुळें व माझ्या सृष्टिसौंदर्य- प्रेमामुळे घडल्या व म्हणूनच माझा यात्रामार्ग वाचकांस पुष्कळ वेळ वेडावाकडा वाटण्याचा संभव आहे. तेव्हां या उपोद्घातरूपी प्रकरणांत मी माझ्या काशीरामेश्वर यात्रा-मार्गाचे व यात्रा-कालाचें दिग्दर्शन करणार आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
rb8pnpxnohaatpmlppo9kvc220o4pwz
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१३
104
110536
230638
2026-06-03T10:04:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230638
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२ |काशी-रामेश्वर यात्रा|}}</noinclude>{{gap}}हिंदुस्थानचे राजमहर्षि दादाभाई नवरोजी शेट यांनी अध्यक्षस्थान मंडित केलेल्या डिसेंबर १९०६ सालच्या काँग्रेसच्या कलकत्ता येथील प्रख्यात बैठकीला मी कै. प्रो. हरिभाऊ लिमये यांचे समवेत हजर राहिलों होतों. कलकत्त्यास जबलपुर मेलनें जातांना आम्हीं प्रयाग-काशी हीं यात्रा-स्थळें प्रथम पाहिली. त्यावेळी प्रवास वर्णनें लिहिण्याची कल्पना सुद्धां माझ्या मनांत आली नव्हती. कारण त्या तरुण वयांत आमचीं मनें राजकीय विषयांनीं भणाणलेलीं असत व मराठी वाङ्मयाकडे अजून आमचें लक्ष वेधलें नव्हतें. तीस वर्षांच्या काळानंतर सुद्धां प्रयाग- काशीबद्दलचा तरतमभाव माझ्या अंतःकरणावर स्पष्ट उमटलेला आहे. सृष्टिसौंदर्याच्या दृष्टीनें मला प्रयाग जास्त आवडलें. यमुना कांठचा तो लांबचलांब तटबंदी किल्ला, किल्ल्याच्या तटावरून उजवीकडे दिसणारा तो रेल्वेचा भव्य पूल, डाव्या हाताला तो काळा पांढरा असा दुरंगी गंगायमुनेचा संगम, हा अद्वितीय देखावा इतक्या काळानंतर सुद्धां माझ्या मनःचक्षूपुढें स्पष्टपणे उभा आहे. हा देखावा पाहिल्यावर आम्ही होडी मधून गंगायमुना व गुप्त असलेली सरस्वती अशा त्रिवेणी संगमाच्या प्रवाहांत जाऊन स्नान केलें. तेव्हां तेथें छातीभर पाणी होते. यमुनेचा तो काळसर प्रवाह व गंगेचा तो पांढूरका प्रवाह प्रत्यक्ष संगमाचे ठिकाणी सुद्धा स्पष्टपणे दिसत असलेला पाहून आम्हाला फारच आश्चर्य वाटलें. प्रयाग पाहून जितका अनुकूल परिणाम आमच्या मनावर झाला तितका काशीचा आमच्या मनावर परिणाम झाला नाहीं. काशी येथील गंगेचा लंबवर्तुळाकार प्रवाह व नदीकांठावरील ते मोठमोठे व एकमेकांना लागलेले घाटचे घाट पाहून कोणा प्रवाशाचें मन प्रसन्न होणार नाहीं? पण काशींतील ते अरुंद बोळ व घाटावरील ती मोऱ्यांची घाण, घाटानजीकच्या प्रवाहावरील तेलाचे तवंग व कुजलेल्या फुलांची घाण हीं पाहून व अनुभवून आमचा काशीबद्दल फारसा अनुकूल ग्रह झाला नाहीं; व घाटावर स्नान करण्यास<noinclude></noinclude>
9tw7w9km70qlouk2ux0qt26xbvidzco
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१४
104
110537
230639
2026-06-03T10:10:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230639
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||यात्रामार्ग व यात्राकाल|३ }}</noinclude>तर आमचें मन घेईना. म्हणून आम्हीं बिऱ्हाडीं येऊन नळावरच गंगास्नान केलें. कारण आम्हीं विचार केला की काशीचे नळ गंगेच्या पाण्याचेच आहेत. तेव्हां घाणेरड्या घाटावरील तेलकट पाण्यांत बुडी मारण्यापेक्षां नळाच्या स्वच्छ व गार पाण्याच्या धारेखालीं स्नान करणे जास्त आरोग्यकारक व तितकेंच पुण्यकारक आहे.
{{gap}}याप्रमाणे माझ्या पूर्ववयांत माझी काशीयात्रा झाली. सन १९०८ मध्ये मी मद्रासच्या काँग्रेसला गेलों होतों. त्यावेळीं रामेश्वरची यात्रा करण्याचे साधलें नाहीं. कारण कलकत्यास जातांना ज्या प्रमाणें काशी वाटेवरच येते त्याप्रमाणे मद्रासला जातांना रामेश्वर वाटेवर येत नसल्यामुळे मद्रासच्या काँग्रेसच्या अनुषंगाने माझी रामेश्वरची यात्रा झाली नाहीं. त्या यात्रेचा योग माझ्या लंका प्रवासाच्या अनुषंगानें आला. सन १९३३ च्या नवंबरमध्यें मी मुंबईहून बोटीनें लंकेस गेलों. त्या वर्षाच्या नाताळच्या सुट्टीत मी दक्षिण हिंदुस्थान व केरल प्रांत पाहण्याकरितां परत हिंदुस्थानांत आलों. तेव्हां प्रथम मीं रामेश्वरच पाहिलें. सेतुरामेश्वरीं स्नान करीत असतांना यात्रेकरूंच्या प्रघाताप्रमाणें मी समुद्र संगमावरील सुंदर वाळू (सेतू) बिऱ्हाडीं आणली. तें बिऱ्हाड एका भटजींच्या घरींच असल्यामुळे व त्यांना कांहीं तरी दक्षिणा पोंचावी अशा बुद्धीनें मी तो सेतू (रेती) यात्रेकरूंच्या रीतीप्रमाणें एका नारळाच्या बेल्यांत विधिपूर्वक भरून घेतला. तेव्हां भटजी म्हणाले आतां तुमची यात्रा संपूर्ण होण्याकरितां हा सेतू तुम्हीं काशी प्रयागला जाऊन तेथें गंगेत टाकला पाहिजे. भटजीला मीं होकारार्थी उत्तर दिलें. लंकेहून देशीं परत आल्यावर व माझ्या प्रवासवृत्तमालेची योजना तयार करीत असतांना मला भटजीच्या सांगण्याची आठवण झाली व "काशी-रामेश्वर यात्रा" नांवाचें एक प्रवासवृत्त लिहिण्याचा मीं मनाशीं निश्चय केला व त्याकरितां पुन्हां एकदां उत्तर हिंदुस्थानांत अयोध्येपर्यंत जाऊन येण्याचा मीं बेत केला. मात्र माझ्या या महायात्रेचा<noinclude></noinclude>
hpxks9d5024avvea8lacbormf5p6jx0
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१५
104
110538
230640
2026-06-03T10:16:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230640
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४ |काशी-रामेश्वर यात्रा|}}</noinclude>मार्ग ठरवितांना मी एका बाणानें दोन, नव्हे, तीन पक्षी मारण्याचा निश्चय केला. माझ्या हिंदुस्थानच्या पंचवीस वर्षांच्या प्रवासक्रमांत मीं सह्याद्रि, सातपुडा, विंध्याद्रि, अरवली व हिमालय इत्यादि पर्वत व त्या वरील वनश्री यांची शोभा पाहिली होती. पण या पर्वतांच्या इतक्याच नव्हे काकणभर जास्त सुंदर वनश्रीनें मंडित असलेला निलगिरी पर्वत व त्यावरील शीतल निवासस्थान '''उटकमंड''' (युरोपीयन लोकांची आवडती उटी) अद्यापपर्यंत पाहिलें नव्हतें. तें दृश्य दर्शन या यात्रेत उरकून घेण्याचें ठरविलें. तसेंच माझ्या काशी रामेश्वर यात्रावृत्तामध्ये जैनधर्मी लोक ज्याला दक्षिण काशी म्हणतात व जें स्थान ते अत्यंत पवित्र समजतात तें '''श्रवणबेलगोला''' हे प्रेक्षणीय स्थळही या यात्राप्रसंगींच पाहण्याचा मी निश्चय केला. हे सर्व साधावें अशा दृष्टीनें मीं आपला यात्रामार्ग मुक्रर केला तो असा. रामेश्वराहून पालघाटपर्यंत साउथ इंडियन रेलवेनें यावयाचें; पालघाटपासून निलगिरीपर्यंत डोंगरी आगगाडीनें प्रवास करावयाचा; तेथून मोटारनें म्हैसूरला यावयाचें व म्हैसूरचे ओझरतें दर्शन घेऊन मोटारनें श्रवणबेलगोल्यास जावयाचे व तें स्थळ पाहून मद्रास सदर्न मराठा रेलवेच्या '''अरसीकेरीला''' यावयाचे व तेथून आगगाडींतून '''पुण्यामुंबईकडे''' जावयाचें व उत्तर हिंदुस्थानांतील रेलवेनें अयोध्येपर्यंत जाऊन तेथे काशी रामेश्वर यात्रा संपवावयाची असा यात्रामार्ग मी ठरविला. पण येवढी मोठी व लांबची यात्रा एकदम व एकावेळी होणें शक्य नव्हतें म्हणून माझ्या सवडीप्रमाणें या मार्गाचे सोयीचे तुकडे पाहून मी ही यात्रा हप्त्या- हप्त्यानें केली. तेव्हां आतां या महायात्रेचा कालक्रम सांगून मी हे उपोद्घातरूपी प्रकरण संपवितों.
{{gap}}रामेश्वरापासून पालघाटपर्यंतचा प्रवास मीं सन १९३३ च्या नाताळच्या सुटीत केला. हा माझ्या यात्रेचा पहिला हप्ता. पालघाट ते श्रवणबेलगोला हा प्रवास मी मार्च सन १९३६ मध्यें केला. हा माझ्या<noinclude></noinclude>
t7io769ttal4iw160pkvqdukuwlbx6a
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१६
104
110539
230641
2026-06-03T10:18:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230641
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||यात्रामार्ग व यात्राकाल|५ }}</noinclude>यात्रेचा दुसरा हप्ता पण तो कालक्रमानें तिसऱ्या हप्त्याचे मागाहून पुरा झाला. जबलपुर ते अयोध्या हा प्रवास मीं मार्च एप्रिल सन १९३५ मध्ये केला. पण जरा कालक्रमामध्यें व्युत्क्रम झाला असला तरी यांचें वर्णन मी भौगोलिक क्रमानें म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे रामेश्वरापासून अयोध्येपर्यंत करणार आहे. तरी पुढील प्रकरणी वाचकांस रामेश्वर दर्शन घडेल इतके सांगून हा उपोद्घात संपवितों.

{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
gzkdogx2plgyko07jm7arhbqlf46env
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१७
104
110540
230646
2026-06-03T11:26:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
230646
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण २ रें.'''}}}}
{{rule|7em}}
{{center|'''रामेश्वर व सेतुरामेश्वर'''}}
{{gap}}{{x-larger|'''हिं'''}}दुस्थानच्या नकाशाकडे पाहिल्यास त्याचे प्रथमतः दोन मोठे भाग पडतात असें तत्क्षणीं दृष्टोत्पत्तीस येतें. हिमालयापासून विंध्यपर्वतापर्यंतचा प्रदेश हा एक भाग व त्याचे दक्षिणेचा दुसरा भाग. आर्यलोक प्रथमतः पंजाबांत आले व लवकरच गंगा यमुना कांठच्या सुपीक, सपाट व सुगम प्रदेशांत त्यांच्या वसाहती पसरल्या. या भागाला ते '''भारतवर्ष किंवा आर्यावर्त''' म्हणत. विंध्याच्या दक्षिणेपलीकडचा भाग पुष्कळ पर्वत राजांनीं व प्रचंड अरण्यांनी व्यापलेला असल्यामुळे त्याला सामान्यतः '''दक्षिणापथ किंवा दंडकारण्य''' म्हणत. येथें आर्याच्या वसाहती फार सावकाशपणें झाल्या. शिवाय, या भागांत रानटी लोकांची मोठी वस्ती असून द्रविड लोकांनीं येथें आर्यांचे पूर्वीच वसाहत केल्यामुळे हा भाग आर्यांना बराच काळ अज्ञात होता. राम हाच एकटा आर्य मनुष्य द्रविड लोकांच्या साहाय्यानें या प्रचंड अरण्यमय व पर्वतमय प्रांतांतून लंकेपर्यंत गेला अशी दंतकथा वाल्मीकी '''रामायणांत''' आलेली आहे. पण कालेकरून या भागाची आर्यांना जास्त माहिती झाली. '''गोदावरी ते कृष्णा''' या भागाला '''महाराष्ट्र''' हे नाव मिळालें व '''कृष्णा ते कावेरी'''पर्यंतच्या प्रांताला ''''कर्नाटक'''' म्हणूं लागले. नीलगिरीच्या खालच्या '''कन्याकुमारी'''पर्यंतच्या प्रांतांत निरनिराळीं राजघराणीं प्रख्यातीस आल्यामुळे त्यांना त्या राजघराण्यांवरून '''पांड्य, चोल व चेर''' अशीं नांवें मिळाली. त्यांपैकीं मलयपर्वत व आरबी समुद्र या मधल्या पट्टीमध्यें '''चेर''' घराण्याचें राज्य होतें व त्या प्रांताला '''केरल''' असें स्वतंत्र नांव होतें.{{nop}}<noinclude></noinclude>
cyt6p6v3eap01gvb51rgowqg7925kxh
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१८
104
110541
230647
2026-06-03T11:31:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{gap}}पूर्वीच्या काळच्या प्रांतमर्यादा कांहींही असोत, त्यांचीं नांवेंही कांहीं असोत, सध्यां दक्षिण हिंदुस्थान हें नांव या सर्व भागाला मिळाल्यासारखे आहे. याच भागांत साऊथ इंडियन र..."
230647
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||रामेश्वर व सेतुरामेश्वर|७ }}</noinclude>{{gap}}पूर्वीच्या काळच्या प्रांतमर्यादा कांहींही असोत, त्यांचीं नांवेंही कांहीं असोत, सध्यां दक्षिण हिंदुस्थान हें नांव या सर्व भागाला मिळाल्यासारखे आहे. याच भागांत साऊथ इंडियन रेलवेच्या रस्त्यांचें जाळें पसरलेलें आहे.

{{gap}}या प्रांताच्या दक्षिण टोकांस रामेश्वर बेट आहे. तें मीं १९३३ च्या नाताळच्या सुटींत प्रथम पाहिलें. मुंबई पुण्याकडून दक्षिण हिंदुस्थानाला जाणारे प्रवासी बहुधा आगगाडीनें या भागांत येत असल्यामुळे रामेश्वर हे त्यांना प्रवासाच्या शेवटीं लागतें. माझा प्रवास मात्र याच्या उलट झाला असल्यामुळे माझ्या प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन उलट्या क्रमानें झाल्यासारखे वाचकांस वाटेल. पण अशा वर्णनाच्या योगें 'लंकेकर' लोक दक्षिण हिंदुस्थानचा प्रवास कसा करीत असतील व त्यांना दक्षिण हिंदुस्थान कसें वाटत असेल हैं वाचकांस कळून येईल. कारण मी मुंबईहून आगबोटीनें प्रथम लंकेस गेलों व मग तिकडून उत्तर दिशेकडे प्रवास करीत दक्षिण हिंदुस्थानांत प्रवेश केला. तेव्हां प्रेक्षणीय स्थळे पाहिलेल्या क्रमानेच त्यांचें वर्णन करणें बरें.

{{gap}}मी ख्रिश्चन लोकांच्या नाताळच्या सणाच्या दिवशीं म्हणजे २५ डिसेंबर सन १९३३ रोजी रात्रीं सात वाजतां लंकेच्या उत्तर प्रांताचे मुख्य शहर जाफना येथून आगगाडीनें दुसऱ्या वर्गानें धनुष्कोडीचे तिकीट काढलें. धनुष्कोडी है दक्षिण हिंदुस्थानच्या रामेश्वर बेटाचें समुद्रांत घुसलेलें दक्षिण टोक होय. आगगाडी दुसरे दिवशी सकाळी बरोबर साहा वाजतां तलाईमानारच्या लंका बेटाचें. उत्तर टोंक - धक्कयावर आली व मी लागलींच आगबोटीवर चढलों तलाई मानारचा धक्का इतका मोठा व समुद्रांत खोलपर्यंत गेला आहे. कीं सबंध लांबलचक आगगाडी धक्क्यावरील रूळावर येते व समोर च आगबोट धक्क्याला लागलेली असते. यामुळे प्लॅटफार्मच्या दोन बाजूंस समोरा समोर उभ्या असलेल्या दोन आगगाड्यांमध्यें ज्याप्रमाणें एका<noinclude></noinclude>
9idut1u4t8kj5t55m7hgrql65ed4cqr
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/१९
104
110542
230648
2026-06-03T11:31:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ काशी - रामेश्वर यात्रा आगगाडींतून दुसऱ्या आगगाडीत बसतां येतें तितक्याच सहज व वसुलभ रीतीनें येथें आगगाडींतून आगबोटीत व आगबोटीतून आग- गाडीत बसतां येतें. अशी सोय आपल्या इकड..."
230648
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
काशी - रामेश्वर यात्रा
आगगाडींतून दुसऱ्या आगगाडीत बसतां येतें तितक्याच सहज व वसुलभ रीतीनें येथें आगगाडींतून आगबोटीत व आगबोटीतून आग- गाडीत बसतां येतें. अशी सोय आपल्या इकडे नसल्यामुळे मला येथल्या सोयीचें नवल वाटलें. हल्लींच्या काळीं प्रवासाची किती विलक्षण सोय झाली आहे असे कौतुकाचे उद्गार माझ्या तोंडून सहज निघाले. आगबोट कोकणांत जाणाऱ्या मोठ्या बोटीप्रमाणे होती व ती बरोबर साहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निवाली. पाल्कच्या आखाताच्या पाण्याचा रंग पोपटी असून सध्यां समुद्र अगदीं शांत होता. सुमारें एकतासपर्यंत मला लंकेचा किनारा दिसत होता. कारण आगबोटीवरचा बहुतेक सर्व वेळ मी बोटीच्या मागच्या टोकापासून पुढच्या टोकापर्यंत बोटीच्या सुकाणू- पासून नाळेपर्यंत - येरझारा करण्यांत घालविला. नंतर लंकेचा किनारा दिसेनासा झाला व हिंदुस्थानचा किनाराही दिसेना. पण सुमारें अर्ध्या तासाच्या आतच हिंदुस्थानचा धनुष्कोडीच्या आसपासचा किनारा दिसूं लागला व थोड्याच वेळांत मंगलोरी कवलांच्या त्या रेलवे व कस्टम या खात्यांच्या तांबंड्यालाल इमारती दिसूं लागल्या. आमचे डाव्या हातास आरची समुद्राचें तें मोरपिशीरंगी नीळसर पाणी, उजव्या हातास बंगालच्या उपसागराचें तें पोपटीरंगी हिरवट पाणी, पुढे समोरच दिसणारी लांबच लांब हिंदुस्थानच्या किनाऱ्याची पांढऱ्या शुभ्र रेतीची ती किनार व तिच्या मध्ये मध्ये त्या तांबड्यालाल रंगाच्या इमारती व दुरंगी समुद्रावर येणाऱ्या लाटांचा तो शुभ्ररंगी फेस, मध्यें मध्ये ढग आल्यानें समुद्राच्या पाण्याच्या छटा क्षणोक्षणीं बदलल्यामुळे नाना- रंगांचा पाण्यावरील जणूं कांहीं तो चित्रपट, हा सर्व देखावा एकसमया- वच्छेदेंकरून दृष्टीस पडल्यामुळे माझे मन त्या विलक्षण देखाव्यांत इतके गढून गेलें कीं आगबोट धक्याला लागली हें माझ्या ध्यानांत आलें नाहीं. पण काळ्या डगल्याचे पोलीस शिपायी व पगड्यावजा तयार केलेल्या रुमालांनी अलंकृत झालेले मद्रासी कस्टमचे अंमलदार
,<noinclude></noinclude>
an8z9t7vxpdyxjpycffrpk7f3nv4nlz