विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.5
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८४
104
73532
230839
166319
2026-06-07T03:07:25Z
Priyanka Choudhari
4169
230839
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="2" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>महाराष्ट्र संस्कृती
{{right|४५६}}{{right|}}
सांगितलेच आहे. त्याच उद्देशाने त्यांनी सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या महाराष्ट्रीय राज-घराण्यांच्या शासन कालातील ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. मागे एका प्रकरणात गोत, देशक या सभांचा उल्लेख केला आहे. मागील काळी गावचा बहुतेक कारभार त्यांच्या-र सोपविलेला असे. मुस्लिमांच्या काळात या सभा निर्जीव झाल्या होत्या. महाराजांनी
स्वराज्यस्थापनेनंतर त्यांची पूर्वीची प्रतिष्ठा त्यांना प्राप्त करून दिली. पाटील, कुलकर्णी,
बारा बलुतेदार, शेटे, महाजन यांची सभा ते गोत होय. गावातील करजांचा न्याय-
निवाडा हे गोतच करीत असे. एखाद्या वादीला या गोताचा निवाडा मान्य झाला नाही
तर दुसन्या गावाच्या गोतापुढे आपला खटला चालावा, अशी मागणी करण्याची
त्यास मुभा होती. परगावच्या गोताला परस्थळ म्हणत. परस्थळाकडे असे खटले
नेल्याची अनेक उदाहरणे मागल्या कागदपत्रांत सापडतात. गोताच्या वरची सभा म्हणजे
देशक होय. देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन, गावचे पाटील यांची सभा ती देशक
सभा होय. सर्वांत वरचे न्यायपीट म्हणजे अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश हे होय.
विज्ञानेश्वर
छत्रपतींनी न्यायदानासाठी स्वतंत्र कायदे केलेले नव्हते. याज्ञवल्क्यस्मृतीवरील
विज्ञानेश्वराची मिताक्षरा ही जी टीका तीच स्वराज्यात न्यायासाठी आधारभूत ग्रंथ
म्हणून मानलेली होती. स. १६६३ सालचा एक न्यायनिवाडा प्रसिद्ध आहे. त्यात,
प्राथमिक साक्षीपुरावे झाल्यानंतर, 'राजश्री नेताजी पासलकर यांनी महाबळेश्वरास
मनुष्य पाठवून विज्ञानेश्वर आणविला आणि पंडित, विद्वंस यांच्या मुखांतरे विज्ञाने-
श्वरामध्ये वृत्तीच्या विशेष विवंचना ज्या होत्या त्या संपूर्ण मनास आणून हक्क निवाडा
केला, ' असे म्हटले आहे.
लोकसत्तेचा पाया
या न्यायपद्धतीने सर्व लोकांना त्वरित व योग्य न्याय मिळण्याची व्यवस्था झाली
आणि ग्रामीण जनतेचे जीवन पूर्वीपेक्षा जास्त सुखावह झाले. पण याहीपेक्षा विशेष
म्हणजे राज्यकारभारात आपण सहभागी आहो, आपणच कारभार करीत आहो,
हा भाव जनतेच्या मनात निर्माण होऊन तिचे कर्तृत्व अधिक विकसित होण्यास संधी
लाभली. अष्टप्रधानमंडळाचे महत्व विशद करताना नानासाहेब सरदेसाई यांनी,
'काही संकुचित व विशिष्ट अर्थाने मराठयांचे राज्य लोकसत्तात्मक राज्य होते, ' असे
म्हटले आहे. 'कारण प्रत्येकाला देशसेवा करण्यास त्यात सवड होती. ज्याने त्याने
स्वतःचे कल्याण करण्यास झटणे म्हणजे एकंदर राज्यात भर घालणे, असा प्रकार
होता.' हेच विवेचन गोतसभा, देशकसभा यांनाही लागू पडण्यासारखे आहे. लोकांनी
स्वतःचा कारभार स्वतः पाहणे याचेच नाव लोकसत्ता. या अर्थाने वरील सभा हा
लोकसत्तेचा पायाच होता.<noinclude></noinclude>
s33d95f26jx1q9gbeqr0b0580hrfly1
230840
230839
2026-06-07T03:11:38Z
Priyanka Choudhari
4169
/* मुद्रितशोधन */
230840
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Priyanka Choudhari" /></noinclude>महाराष्ट्र संस्कृती
{{right|४५६}}{{right|}}
सांगितलेच आहे. त्याच उद्देशाने त्यांनी सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या महाराष्ट्रीय राज-घराण्यांच्या शासन कालातील ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. मागे एका प्रकरणात गोत, देशक या सभांचा उल्लेख केला आहे. मागील काळी गावचा बहुतेक कारभार त्यांच्या-वर सोपविलेला असे. मुस्लिमांच्या काळात या सभा निर्जीव झाल्या होत्या. महाराजांनी स्वराज्यस्थापनेनंतर त्यांची पूर्वीची प्रतिष्ठा त्यांना प्राप्त करून दिली. पाटील, कुलकर्णी, बारा बलुतेदार, शेटे, महाजन यांची सभा ते गोत होय. गावातील करजांचा न्याय- निवाडा हे गोतच करीत असे. एखाद्या वादीला या गोताचा निवाडा मान्य झाला नाही तर दुसन्या गावाच्या गोतापुढे आपला खटला चालावा, अशी मागणी करण्याची त्यास मुभा होती. परगावच्या गोताला परस्थळ म्हणत. परस्थळाकडे असे खटले नेल्याची अनेक उदाहरणे मागल्या कागदपत्रांत सापडतात. गोताच्या वरची सभा म्हणजे देशक होय. देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन, गावचे पाटील यांची सभा ती देशक सभा होय. सर्वांत वरचे न्यायपीट म्हणजे अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश हे होय.

'''विज्ञानेश्वर'''

{{gap}}छत्रपतींनी न्यायदानासाठी स्वतंत्र कायदे केलेले नव्हते.याज्ञवल्क्यस्मृतीवरील
विज्ञानेश्वराची मिताक्षरा ही जी टीका तीच स्वराज्यात न्यायासाठी आधारभूत ग्रंथ
म्हणून मानलेली होती. स. १६६३ सालचा एक न्यायनिवाडा प्रसिद्ध आहे. त्यात,
प्राथमिक साक्षीपुरावे झाल्यानंतर, 'राजश्री नेताजी पासलकर यांनी महाबळेश्वरास
मनुष्य पाठवून विज्ञानेश्वर आणविला आणि पंडित, विद्वंस यांच्या मुखांतरे विज्ञाने-
श्वरामध्ये वृत्तीच्या विशेष विवंचना ज्या होत्या त्या संपूर्ण मनास आणून हक्क निवाडा
केला, ' असे म्हटले आहे.

'''लोकसत्तेचा पाया'''

{{gap}}या न्यायपद्धतीने सर्व लोकांना त्वरित व योग्य न्याय मिळण्याची व्यवस्था झाली आणि ग्रामीण जनतेचे जीवन पूर्वीपेक्षा जास्त सुखावह झाले. पण याहीपेक्षा विशेष म्हणजे राज्यकारभारात आपण सहभागी आहो, आपणच कारभार करीत आहो, हा भाव जनतेच्या मनात निर्माण होऊन तिचे कर्तृत्व अधिक विकसित होण्यास संधी लाभली. अष्टप्रधानमंडळाचे महत्व विशद करताना नानासाहेब सरदेसाई यांनी, 'काही संकुचित व विशिष्ट अर्थाने मराठयांचे राज्य लोकसत्तात्मक राज्य होते, ' असे म्हटले आहे. 'कारण प्रत्येकाला देशसेवा करण्यास त्यात सवड होती. ज्याने त्याने स्वतःचे कल्याण करण्यास झटणे म्हणजे एकंदर राज्यात भर घालणे, असा प्रकार होता.' हेच विवेचन गोतसभा, देशकसभा यांनाही लागू पडण्यासारखे आहे. लोकांनी स्वतःचा कारभार स्वतः पाहणे याचेच नाव लोकसत्ता. या अर्थाने वरील सभा हा लोकसत्तेचा पायाच होता.
<noinclude></noinclude>
cggi5axbrng1oom7c1fjm1q4zpjfeau
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८५
104
73533
230841
166320
2026-06-07T03:16:00Z
Priyanka Choudhari
4169
/* मुद्रितशोधन */
230841
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{left|४५७}}{{right|यशापयश-मीमांसा}}
'''मोठा प्रश्न'''

{{gap}}शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्रनिष्ठा निर्माण केली, त्यांनी लोकशाहीचा पाया
घातला, असे वर म्हटले आहे. अनेक इतिहासपंडितांनीही हा विचार मांडलेला आहे.
त्यावरून मग मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. पश्चिम युरोपात चौदाव्या पंधराव्या शतकात याच निष्ठांचा उदय झाला होता आणि त्यामुळे हळूहळू तेथील देश, विशे-पतः इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड हे देश समृद्ध, बलाढ्य झाले, आणि त्यांनी सर्व जगावर आपले प्रभुत्व स्थापन केले. तसे महाराष्ट्रात व भारतातील इतर देशांत का झाले नाही ?

'''प्रबोधन नाही'''

{{gap}}याचे उत्तर असे की पश्चिम युरोपात त्या काळात जे समाजप्रबोधन झाले ते भार
तात कोणत्याही प्रांतात झाले नाही. छत्रपतींनी कार्य केले त्यामागे प्रबोधनाची काही
काही तथ्ये होती. पण त्या तत्यांचे विवेचन करून, त्यावर ग्रंथ लिहून त्यांचा समाजात प्रसार करण्याचे जे कार्य शास्त्रीपंडितांनी करावयास हवे ते येथे कोणीच केले नाही. एकटा एक नेता, तो महापुरुष असला तरी, शिवछत्रपतींनी जे कार्य केले त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. त्यांनी जे केले त्याच्या शतांशसुद्धा युरोपातल्या त्या वेळच्या राजांना करता आले नव्हते. राष्ट्रभावना, लोकसत्ता, धर्मसुधारणा, आर्थिक क्रांती या गोष्टी एका माणसाच्या नव्हेतच. शेकडो, हजारो पंडित, तत्ववेत्ते, शास्त्रश, प्रवचनकार, वक्ते, कार्यकर्ते यांनी तनमनधन अर्पून हे कार्य करणे अवश्य असते. हा व्याप केवढा प्रचंड आहे याची सम्यक कल्पना यावी म्हणून पश्चिम युरोपातल्या समाजप्रबोधनाची थोडी माहिती देतो.

'''शास्त्र संशोधन'''

{{gap}}प्रबोधनाच्या श्रेयाचा फार मोठा वाटा त्या काळात उदयास आलेल्या शास्त्रज्ञांचा आहे. रॉजर बेकन हा तेराव्या शतकातला शास्त्रश. हा फॅन्सिस्कन पंथाचा धर्मगुरू होता. तरी रूढ धर्ममते त्याला मान्य नव्हती. अवलोकन व प्रयोग यांनी स्वतंत्र बुद्धीने सत्याचा शोध घ्यावा, अशी ज्ञानपद्धती त्याने उपदेशिली. चाक्षुप विज्ञान, परावर्तनाचे नियम, इंद्रधनुष्य, गुरुदर्शक भिंग हे त्याच्या संशोधनाचे विषय होते. त्याची मते पोपच्या धर्मपीठाला पाखंडी वाटत. म्हणून त्याने या थोर शास्त्रशाला चोवीस वर्षे कारागृहात बद्ध करून ठेविले होते. तरीही शास्त्रीय सत्यावरील आपली निष्ठा त्याने ढळू दिली नाही. यामुळेच हळूहळू युरोपात बुद्धि-स्वातंत्र्याचा परिपोष झाला. हे भारतात घडले नाही. रॉजर बेकननंतर कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ, न्यूटन या थोर शास्त्रज्ञांनी तीच परंपरा पुढे चालविली. आणि फॅन्सिस बेकन याने,
<noinclude></noinclude>
jcmnehgm3sc2k9gja95u9xm7fc75thq
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७७
104
73535
230832
164582
2026-06-07T03:02:15Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230832
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४५१|| शिवछत्रपतींची युद्धविद्या}}</noinclude>युद्धविद्या शिकवून, मुस्लिम सत्ता नामोहरम करून, स्वराज्याची स्थापना केली. मराठा राजा सिंहासनाधीश्वर झाला. यामुळे जे हिंदू या कलियुगात हिंदुराजा होणे नाही, मुसलमानच आता राज्य करणार, असे मानण्याइतके मरगळले होते, त्यांच्या मनापुढे इराण, रूमशाम येथपर्यंत स्वराज्यस्थापना करण्याची स्वप्ने तरळू लागली ! छत्रपतींचे अवतारकार्य ते हेच.
{{gap}}आता छत्रपतींच्या आयुष्याच्या पन्नास वर्षाच्या काळात महाराष्ट्रात, ज्या घडामोडी झाल्या, जी परिवर्तने झाली त्यांचे, युरोपात याच काळात जे समाजप्रबोधन चालू होते त्याच्याशी तुलना करून, थोडे मूल्यमापन पुढील लेखात करू आणि क्षत्रिय- कुलावंतस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांच्या या कार्याचे हे विवेचन संपवू.

{{center|■}}<noinclude></noinclude>
icm75qezxp4iz5cr3mxjbgqel27q0fh
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७८
104
73536
230833
164583
2026-06-07T03:02:26Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230833
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 478
|bSize = 408
|cWidth = 291
|cHeight = 152
|oTop = 57
|oLeft = 57
|Location = center
|Description =

{{rh|'''२३.'''||'''यशापयश-मीमांसा'''}}

{{gap}}महाराष्ट्र-संस्कृतीच्या दृष्टीने आपण शिवछपतींच्या कार्याचे अवलोकन करीत आहोत. त्यांनी केलेले धर्मपरिवर्तन, त्यांची नवी अर्थव्यवस्था, त्यांचे राष्ट्रनिर्मितीचे प्रयत्न आणि त्यांची युद्धविद्या यांचे विवेचन येथवर केले. आता त्यांच्या प्रशासन- पद्धतीचे म्हणजेच राज्यकारभार- पद्धतीचे स्वरूप पहावयाचे आहे; आणि मग समाज- प्रबोधनाच्या दृष्टीने या सर्वाची चिकित्सा करावयाची आहे.

'''अष्टप्रधानमंडळ'''
{{gap}}त्यांच्या प्रशासन पद्धतीतली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे अष्टप्रधान- मंडळ ही होय. भारतात प्राचीन काळी राजाचे प्रधानमंडळ ही संस्था दीर्घकालपर्यंत रूढ झालेली होती. रामायण, महाभारत, कौटिल्याचे अर्थशास्त्र, मनुस्मृती, शुक्रनीती या ग्रंथांत या प्रधानमंडळाचे सविस्तर वर्णन आहे आणि त्याचे महत्त्वही विशद केलेले आहे. त्या प्राचीन परंपरेचेच छत्रपतींनी अनुकरण केले हे उघड आहे. अलीकडे याविषयी काही वाद निर्माण झाले आहेत. मुस्लिमांचे अनुकरण करून महाराजांनी आपले अष्टप्रधान मंडळ बनविले असे कोणी म्हणतात. स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नास लागताच त्यांनी काही प्रधानांची नेमणूक केली होती आणि त्यांना पेशवा, डबीर, सुरनीस, वाकनीस, सरनोबत अशी फारशी नावे त्यांनी दिली होती. त्यामुळे मुस्लिमांच्या अनुकरणाने त्यांनी अष्टप्रधान मंडळ केले कसा कोणाचा तरी समज झाला असावा. पण तो केवळ गैरसमज होय, हे प्राचीन ग्रंथांतून या परंपरेचे जे वर्णन आहे, त्यावरून स्पष्ट होईल. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी ही नावेही काढून टाकली<noinclude></noinclude>
6twfwp1ktnu6otjci1u6a322zjzl73n
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४७९
104
73537
230834
164584
2026-06-07T03:04:06Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230834
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४५३|| यशापयश-मीमांसा}}</noinclude>आणि पंतप्रधान, पंत अमात्य, पंतसचीव, मंत्री, सुमंत अशी संस्कृत अभिधाने प्रधानांना दिली. आणि त्याच वेळी रघुनात भट्ट उपाध्ये चंदावरकर- पंडितराव यांच्याकडून राज्यव्यवहार कोश करवून घेऊन सर्व राज्यव्यवहारच संस्कृतभाषी करून टाकला. प्राचीन परंपरेचा असा अभिमान ज्याच्या ठायी होता तो त्या परंपरेकडे दुर्लक्ष करून, प्रशासनाला प्राणभूत असलेल्या संस्थेसाठी मुस्लिमांचे अनुकरण करील, हे अगदी असंभव आहे. तेव्हा या वादाचा क्षणभर मुद्धा विचार करण्याचे कारण नाही.

'''लोककल्याण उद्दिष्ट'''
{{gap}}छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली ती राज्यकारभाराच्या सुकरतेसाठी हे उघडच आहे. 'अत्यंत अल्प कार्यसुद्धा एकट्या एक माणसाला साधणे कठीण असते. मग राज्यासारखे सर्वश्रेष्ठ कार्य एकट्या माणसाला- तो कितीही थोर असला तरी कसे साधणार ?' असे शुक्रनीतीत म्हटले आहे. हे ध्यानात घेऊन महाराजांनी प्रारंभापासूनच एकेका मंत्र्याची नेमणूक करण्याचा उपक्रम केला होता. पण कारभाराची सुकरता याच एका दृष्टीने अष्टप्रधान मंडळाचे महत्त्व होते असे नाही. त्याची स्थापना करून, महाराजांनी फार मोठे सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणले, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे. सरदेसायांनी त्याचे उत्तम विवेचन केले आहे.
{{gap}}राज्य हे लोकांच्या सुखासाठी, प्रजेच्या कल्याणासाठी असते, हे प्राचीन महातत्त्व महाराजांना पुन्हा प्रस्थापित करावयाचे होते. मुसलमानी राज्यात हे उद्दिष्ट कधीच नव्हते. सरदेसाई म्हणतात, 'मुसलमानांच्या अनेक राजघराण्यांत प्रजेच्या सुखाची परवा करणारे राजघराणे फक्त मोगलांचे झाले. त्यातही अकबर व शहाजहान या दोनच कारकीर्दी नावाजलेल्या आहेत. परंतु या बादशाहीचे स्वरूप लष्करी बाण्याचे होते. म्हणजे केवळ लष्करी जोरावर देश जिंकून त्याचे संरक्षण करावयाचे, यापलीकडे राज्यव्यवस्थेची मजल फारशी गेलेली नव्हती. उलटपक्षी शिवाजीच्या राज्याची मजबुती, मोगलांप्रमाणे लष्करी जोरावर रचलेली नसून, लोकसुखवृद्धीवर स्थापिलेली होती. शिवाजीचे मूळपासून धोरणच तशा प्रकारचे होते. केवळ स्वतःच्या अभिवृद्ध्यर्थ त्याने हे काम केलेले नाही. त्याचे प्रत्येक कृत्य सार्वजनिक हिताचे होते. लोक दांडगाई करू लागले तर पुष्कळशी फौज जमवून, मोगलांप्रमाणे केवळ तलवारीच्या जोरावर त्यास दाबात ठेवणे, शिवाजीस सहन झाले नसते. तो आपल्या देशाकरिता, राष्ट्राकरिता म्हणजे राष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीकरता उद्योग करीत होता. शिवाजी व मोगल बादशहा यांजमधील हा महत्त्वाचा फरक होय.' (मराठी रियासत; पूर्वार्ध, पृ. ४५५) 'मुसलमानी राज्यपद्धतीत शिवाजीच्यासारखे प्रधानमंडळ नव्हते, असेच म्हणणे भाग पडते. अशा प्रधानमंडळाची योजना केवळ प्रजेच्या कल्याणासाठीच उत्पन्न होत असते.'(पृ. ४५४)
<noinclude></noinclude>
c1v9tj42l21osx19sspernd89h35l7l
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८०
104
73538
230835
164585
2026-06-07T03:04:19Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230835
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४५४}}</noinclude>
'''सत्तानियंत्रण'''
{{gap}}लोकसुख, राष्ट्रहित, प्रजाकल्याण हा जसा अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेमागे एक हेतू होता तसाच दुसराही एक महत्त्वाचा हेतू होती. राजसत्तेवर नियंत्रण घालणे हा तो हेतू होय. सामान्यतः लोक जागृत झाले की राजसत्तेवर नियंत्रण येते. पण येथे छत्रपतींनी स्वतःहून प्रधानमंडळ नेमून स्वतःच्या सत्तेवर मर्यादा घातली होती. नानासाहेबांनी यासाठी छत्रपतींचा फार गौरव केला आहे. ते म्हणतात, असा स्वतःवर आपला आपण दाब ठेवून येणे, मनाचे विशिष्ट औदार्य असल्याशिवाय होत नाही. असे औदार्य एकाही मुसलमान बादशहात नव्हते. इंग्लंडच्या राजातही ते बेताचेच होते.' (वरील ग्रंथ, पृ. ४५९)

'''हत्तीचे अंकुश'''
{{gap}}रामचंद्रपंत अमात्य यांनी प्रधानांचे महत्त्व सांगितले आहे. त्यात, 'प्रधान म्हणजे हत्तींचे अंकुश', असेच त्यांचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'प्रधान म्हणजे राज्यलक्षणगृहाचे स्तंभ आहेत. प्रधान म्हणजे नृपसत्ताप्रसारक, प्रधान म्हणजे प्रजापालन, धर्मसंरक्षणाचे अध्यक्ष, प्रधान म्हणजे राजमदजनित अन्यायसागराची मर्यादा, प्रधान म्हणजे हस्तीचे अंकुश, प्रधानापेक्षा राजेलोकांस इतर आप्त व अधिकोत्तर किमपि नाही; म्हणून प्रधानांची भीड राजांनी सर्वोपेक्षा अधिकोत्तर वागवावी आपले शासनाप्रमाणेच त्यांचे शासन सकळांवर चालवावे. समयविशेषे आपला आग्रह सोडून त्यांचा शब्द चालविलासा करावा.' स्वसत्तेला आपण होऊन मर्यादा घालण्याची ही वृत्ती ! यालाच संस्कृती म्हणतात.

'''दिवाणी सत्ता'''
{{gap}}अष्टप्रधानांची नेमणूक करून महाराजांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट साधली. 'सामान्यतः कोणत्याही देशाच्या कारभारात लष्करी व दिवाणी अशी दोन अंगे मुख्य असतात. प्रथमतः अंतर्बाह्य शांततारक्षणासाठी लष्करी अंगाची जरूर असते. पण हे अंग प्रधान नव्हे. लोकसुखाचे साधन दिवाणी कारभारावर अवलंबून असते. ज्या राज्यात लष्करी सत्ता दिवाणी सत्तेच्या ताब्यात असते, त्या राज्यात लोकसुखाची मर्यादा अत्यंत वाढलेली असते. मोगल बादशाहीचा कारभार बहुतेक लष्करी स्वरूपाचा होता. लष्करी जोरावर लोकांकडून पैसे वसूल करणे, हे प्रांताच्या लष्करी सुभेदाराचे मुख्य काम असे. परंतु शिवछत्रपतींनी राज्यकारभाराची व्यवस्था ठरविली, तेव्हा त्यांनी लष्करी धोरणास अगदी मागे ठेविले. आठ प्रधानांपैकी एकच प्रधान लष्करी ठेविला. इतर सहा प्रधानांस जरी लष्करी काम करावे लागत असे तरी, त्या प्रधानांचे मुख्य कार्य दिवाणी कारभारक्षेत्रातले होते. छत्रपती तेच आपले मुख्य कार्य समजत असत.' नानासाहेबांप्रमाणे डॉ. सेन यांनीही छत्रपतींच्या राज्य-<noinclude></noinclude>
2j424a5kubi9olw7rn9kn2plytrvwb8
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८१
104
73539
230836
164586
2026-06-07T03:04:41Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230836
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४५५|| यशापयश-मीमांसा}}</noinclude>कारभाराचे हे वैशिष्ट्य सांगितले आहे. मुलकी कारभारात लष्कराला, खुद्द सरनोबताला- सेनापतीला- सुद्धा ढवळाढवळ करण्याचा मुळीच अधिकार नव्हता. छत्रपतींनी ते कधीच सहन केले नसते, असे ते म्हणतात. रामचंद्रपंत अमात्य यांनीही हेच तत्त्व सांगितले आहे. 'संपूर्ण राज्यभार, देशदुर्गाचा अखत्यार, सरकारकुनाचे (प्रधानाचे) हाती असावा. सेनानायक त्या अधीन करावे.'

'''कर्तबगार माणसे'''
{{gap}}शिवछत्रपतींनी राज्याची आठ अंगे करून कारभाराची योजना आखली आणि ती पार पाडण्यासाठी अत्यंत लायक व कार्यक्षम असेच प्रधान नेमले. त्यांनी पुढीलप्रमाणे कार्यक्षेत्रे आखून दिली होती. (१) पंतप्रधान (पेशवा) याने सर्व राज्यकार्य करावे. राजपत्रावर शिक्का करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी. तालुका ताब्यात येईल तो रक्षून चालावे. (२) पंत अमात्य (मुजुमदार) याने सर्व राज्यातील जमाखर्चाची चौकशी करावी. फडनिशी पत्रावर निशाण करावे, युद्धप्रसंग करावे. सर्व लष्करी व मुलकी खात्यांचे हिशेब याने तपासावे. (३) सचीव (सुरनीस) याने सर्व राजपत्रांचा शोध घेऊन मजकूर शुद्ध करावा आणि एकंदर सर्व सरकारी दप्तराची व्यवस्था पहावी. (४) मंत्री (वाकनीस) याच्या ताब्यात अठरा कारखाने व बारा महाल यांचा कारभार असून खाजगीकडील दप्तर व पत्रव्यवहार याच्याचकडे असे. (५) सेनापती (सरनोबत) याचा अधिकार सर्व लष्करावर चाले. एकंदर फौजच्या शिस्तीची जबाबदारी त्याजवर असे. (६) सुमंत (डबीर) परराज्याशी होणाऱ्या सर्व व्यवहाराची कामे याच्याकडे असत. (७) न्यायाधीश - याच्याकडे सर्व न्यायखाते होते. (८) पंडितराव- शास्त्रार्थ सांगणे, देवस्थाने, दानधर्म यांची व्यवस्था याच्याकडे होती. या आठ पदांवर नेमलेले अधिकारी- मोरोपंत पिंगळे, रामचंद्रपंत अमात्य बावडेकर, अनाजी दत्तो प्रभुणीकर, दत्ताजी त्रिमल, हंबीरराव मोहिते, जनार्दनपंत हणमंते, निराजी रावजी, रघुनाथभट्ट उपाध्ये- हे सर्व कर्तबगार होते. महाराज माणसांची निवड अत्यंत कसोशीने व दक्षतेने करीत. कर्तृत्व, गुणसंपदा ही एकच कसोटी ते लावीत, वंशपरंपरेने कोणतीही जागा कधीही कोणालाही देत नसत, वतन किंवा जहागीरही देत नसत आणि नेमलेल्या अधिकाऱ्यांस भरपूर पगार देत असत. पंतप्रधान पेशवा याला पंधरा हजार होन म्हणजे सालीना ५२००० रु. मिळत. त्या वेळचे बाजारभाव ध्यानात घेता हा पगार आजच्या दसपट होता. या अष्टप्रधानांपैकी काही प्रधान समर्थ रामदासांचे शिष्य होते. आणि महाराजांच्यावर त्यांची अनन्यभक्ती होती. त्यामुळेच त्यांनी तनमनधनाने झिजून उत्तम राज्यकारभार केला आणि महाराष्ट्रात नवी सृष्टी निर्माण केली.

'''न्यायपद्धती'''
{{gap}}छत्रपतींच्या राज्यकारभाराचे अंतिम उद्दिष्ट लोकसुख, लोककल्याण हे होते, हे वर<noinclude></noinclude>
986umvmndk0zbo1rr2bovfgdlbn88mr
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८२
104
73540
230837
164587
2026-06-07T03:04:57Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230837
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४५६}}</noinclude>सांगितलेच आहे. त्याच उद्देशाने त्यांनी सातवाहन, राष्ट्रकूट, यादव या महाराष्ट्रीय राजघराण्यांच्या शासनकाळातील ग्रामसंस्थेचे पुनरुज्जीवन केले. मागे एका प्रकरणात गोत, देशक या सभांचा उल्लेख केला आहे. मागील काळी गावचा बहुतेक कारभार त्यांच्यावर सोपविलेला असे. मुस्लिमांच्या काळात या सभा निर्जीव झाल्या होत्या. महाराजांनी स्वराज्यस्थापनेनंतर त्यांची पूर्वीची प्रतिष्ठा त्यांना प्राप्त करून दिली. पाटील, कुलकर्णी, बारा बलुतेदार, शेटे, महाजन यांची सभा ते गोत होय. गावातील कब्जांचा न्याय- निवाडा हे गोतच करीत असे. एखाद्या वादीला या गोताचा निवाडा मान्य झाला नाही तर दुसऱ्या गावाच्या गोतापुढे आपला खटला चालावा, अशी मागणी करण्याची त्यास मुभा होती. परगावच्या गोताला परस्थळ म्हणत. परस्थळाकडे असे खटले नेल्याची अनेक उदाहरणे मागल्या कागदपत्रांत सापडतात. गोताच्या वरची सभा म्हणजे देशक होय. देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन, गावचे पाटील यांची सभा ती देशक सभा होय. सर्वात वरचे न्यायपीठ म्हणजे अष्टप्रधान मंडळातील न्यायाधीश हे होय.

'''विज्ञानेश्वर'''
{{gap}}छत्रपतींनी न्यायदानासाठी स्वतंत्र कायदे केलेले नव्हते. याज्ञवल्क्यस्मृतीवरील विज्ञानेश्वराची मिताक्षरा ही जी टीका तीच स्वराज्यात न्यायासाठी आधारभूत ग्रंथ म्हणून मानलेली होती. स. १६६३ सालचा एक न्यायनिवाडा प्रसिद्ध आहे. त्यात, प्राथमिक साक्षीपुरावे झाल्यानंतर, 'राजश्री नेताजी पासलकर यांनी महाबळेश्वरास मनुष्य पाठवून विज्ञानेश्वर आणविला आणि पंडित, विद्वंस यांच्या मुखांतरे विज्ञानेश्वरामध्ये वृत्तीच्या विशेष विवंचना ज्या होत्या त्या संपूर्ण मनास आणून हक्क निवाडा केला,' असे म्हटले आहे.

'''लोकसत्तेचा पाया'''
{{gap}}या न्यायपद्धतीने सर्व लोकांना त्वरित व योग्य न्याय मिळण्याची व्यवस्था झाली आणि ग्रामीण जनतेचे जीवन पूर्वीपेक्षा जास्त सुखावह झाले. पण याहीपेक्षा विशेष म्हणजे राज्यकारभारात आपण सहभागी आहो, आपणच कारभार करीत आहो, हा भाव जनतेच्या मनात निर्माण होऊन तिचे कर्तृत्व अधिक विकसित होण्यास संधी लाभली. अष्टप्रधानमंडळाचे महत्त्व विशद करताना नानासाहेव सरदेसाई यांनी, 'काही संकुचित व विशिष्ट अर्थाने मराठ्यांचे राज्य लोकसत्तात्मक राज्य होते,' असे म्हटले आहे. 'कारण प्रत्येकाला देशसेवा करण्यास त्यात सवड होती. ज्याने त्याने स्वतःचे कल्याण करण्यास झटणे म्हणजे एकंदर राज्यात भर घालणे, असा प्रकार होता.' हेच विवेचन गोतसभा, देशकसभा यांनाही लागू पडण्यासारखे आहे. लोकांनी स्वतःचा कारभार स्वतः पाहणे याचेच नाव लोकसत्ता. या अर्थाने वरील सभा हा लोकसत्तेचा पायाच होता.
<noinclude></noinclude>
6lfm241umnyt79wki4y4c2mq0kwbo6p
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८३
104
73541
230838
164588
2026-06-07T03:05:10Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230838
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४५७|| यशापयश-मीमांसा}}</noinclude>
'''मोठा प्रश्न'''
{{gap}}शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात राष्ट्रनिष्ठा निर्माण केली, त्यांनी लोकशाहीचा पाया घातला, असे वर म्हटले आहे. अनेक इतिहासपंडितांनीही हा विचार मांडलेला आहे. त्यावरून मग मनात एक मोठा प्रश्न उभा राहतो. पश्चिम युरोपात चौदाव्या पंधराव्या शतकात याच निष्ठांचा उदय झाला होता आणि त्यामुळे हळूहळू तेथील देश, विशेषतः इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, हॉलंड हे देश समृद्ध, बलाढ्य झाले, आणि त्यांनी सर्व जगावर आपले प्रभुत्व स्थापन केले. तसे महाराष्ट्रात व भारतातील इतर देशांत का झाले नाही ?

'''प्रबोधन नाही'''
{{gap}}याचे उत्तर असे की पश्चिम युरोपात त्या काळात जे समाजप्रबोधन झाले ते भारतात कोणत्याही प्रांतात झाले नाही. छत्रपतींनी कार्य केले त्यामागे प्रबोधनाची काही काही तत्त्वे होती. पण त्या तत्त्वांचे विवेचन करून, त्यावर ग्रंथ लिहून त्यांचा समाजात प्रसार करण्याचे जे कार्य शास्त्रीपंडितांनी करावयास हवे, ते येथे कोणीच केले नाही. एकटा एक नेता, तो महापुरुष असला तरी, शिवछत्रपतींनी जे कार्य केले त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. त्यांनी जे केले त्याच्या शतांशमुद्धा युरोपातल्या त्या वेळच्या राजांना करता आले नव्हते. राष्ट्रभावना, लोकसत्ता, धर्मसुधारणा, आर्थिक क्रांती या गोष्टी एका माणसाच्या नव्हेतच. शेकडो, हजारो पंडित, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ, प्रवचनकार, वक्ते, कार्यकर्ते यांनी तनमनधन अर्पून हे कार्य करणे अवश्य असते. हा व्याप केवढा प्रचंड आहे याची सम्यक कल्पना यावी म्हणून पश्चिम युरोपातल्या समाजप्रबोधनाची थोडी माहिती देतो.

'''शास्त्रसंशोधन'''
{{gap}}
प्रबोधनाच्या श्रेयाचा फार मोठा वाटा त्या काळात उदयास आलेल्या शास्त्रज्ञांचा आहे. रॉजर बेकन हा तेराव्या शतकातला शास्त्रज्ञ. हा फ्रॅन्सिस्कन पंथाचा धर्मगुरू होता. तरी रूढ धर्ममते त्याला मान्य नव्हती. अवलोकन व प्रयोग यांनी स्वतंत्र बुद्धीने सत्याचा शोध घ्यावा, अशी ज्ञानपद्धती त्याने उपदेशिली. चाक्षुप विज्ञान, परावर्तनाचे नियम, इंद्रधनुष्य, गुरुदर्शक भिंग हे त्याच्या संशोधनाचे विषय होते. त्याची मते पोपच्या धर्मपीठाला पाखंडी वाटत. म्हणून त्याने या थोर शास्त्रज्ञाला चोवीस वर्षे कारागृहात बद्ध करून ठेविले होते. तरीही शास्त्रीय सत्यावरील आपली निष्ठा त्याने ढळू दिली नाही. यामुळेच हळूहळू युरोपात बुद्धि-स्वातंत्र्याचा परिपोष झाला. हे भारतात घडले नाही. रॉजर बेकननंतर कोपरनिकस, केप्लर, गॅलिलिओ, न्यूटन या थोर शास्त्रज्ञांनी तीच परंपरा पुढे चालविली. आणि फ्रॅन्सिस बेकन याने,<noinclude></noinclude>
dshtvaiml1l3la1mbdz8ftahlofl78h
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८६
104
73542
230842
164589
2026-06-07T03:19:32Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230842
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४५८}}</noinclude>'ॲडव्हान्समेंट ऑफ नॉलेज', 'नोव्हम और गॅनम्' इ. ग्रंथ लिहून नव्या बौद्धिक संस्कृतीची प्रस्थापना केली. सत्यदेवता ही बायबलची कन्या नसून मानवी प्रज्ञेची कन्या आहे, असे त्याचे तत्त्वज्ञान होते.
{{gap}}या शास्त्रज्ञांनी सूर्य, पृथ्वी, तारे यांचे जे रूप लोकांना प्रत्यक्ष दाखविले ते बायबलने वर्णन केलेल्या रूपापेक्षा अगदी निराळे होते; त्यामुळे बायबल, पोप, धर्मगुरू यांच्यावरील लोकांच्या अंधश्रद्धेला तडा गेला आणि त्या प्रमाणात त्यांची बुद्धी स्वतंत्र झाली.

'''जगप्रवास'''
{{gap}}त्या युगातल्या जगप्रवासी लोकांनी त्या श्रद्धेला असाच आणखी एक धक्का दिला. मार्को पोलो हा प्रवासी तेराव्या शतकात आशिया खंड पाहून इटलीला परत गेला. त्याचा ग्रंथ वाचून पोर्तुगालचा राजा प्रिन्स हेन्री याच्या चित्तात समुद्रपर्यटनाची प्रबळ आकांक्षा निर्माण झाली. पोर्तुगीज खलाशी आफ्रिकेला वळसा घालण्याचा प्रयत्न करू लागले. १४९२ साली कोलंबस अमेरिकेला जाऊन आला आणि १४९८ साली वास्को द गामा हिंदुस्थानापर्यंत पोचला. मॅगेलनच्या बोटींनी याच सुमारास पृथ्वीप्रदक्षिणा पुरी केली. यामुळे पृथ्वी, समुद्र, पाताळ, यासंबंधीचे बायबलचे सिद्धांत पार उद्ध्वस्त झाले. पोपच्या धर्मसत्तेला मोठा हादरा बसला. मानवी मन मुक्त होऊ लागले.

'''धर्मसत्तेशी लढा'''
{{gap}}आकाशस्थ ग्रहगोलतारे आणि पृथ्वीवरचे भूखंड आणि समुद्र यांचे हे जे संशोधक त्यांनी चालविलेला लढा हा अप्रत्यक्ष लढा होता. त्यांच्या साथीला पोपच्या अंध, हेकट, दुराग्रही, भ्रष्ट, आणि उन्मत्त सत्तेला आव्हान देऊन पोपशी प्रत्यक्ष लढा करणारे थोर पुरुषही याच सुमारास उभे राहिले. ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्रा. जॉन वायक्लिफ हा अशा लोकांत अग्रगण्य होता. मनुष्य व परमेश्वर यांमध्ये मध्यस्थ म्हणून पोप, कार्डिनल, बिशप, प्रीस्ट अशा धर्माचार्यांची मुळीच गरज नाही, मनुष्याने स्वतंत्रपणे भक्ती, प्रार्थना, नामस्मरण करून मोक्ष मिळवावा, असे तो निर्भयपणे प्रतिपादन करीत असे. बायबल हा ग्रंथ त्या वेळी लॅटिन भाषेत होता. त्याचे पठण व अध्ययन लोकांनी स्वतः करण्यास पोपची सक्त मनाई होती. अशा लोकांना तो देहदंडाची शिक्षा सांगे. आपल्याकडे शूद्रांना वेदपठणासन बंदी होती. तसाच हा प्रकार होता. वायक्लिफने पोपचा हा दण्डक उपमर्दून बायबलचे इंग्रजीत भाषांतर केले, त्याच्या हस्तलिखित प्रती देशभर पसरून दिल्या आणि बायबल पठणाचा प्रत्येकास अधिकार आहे असा सिद्धांत मांडला. शिवाय पोपचे ऐहिक ऐश्वर्य व त्याचे भोगविलास यांवरही त्याने कडक टीका केली. बोहेमियातील प्रागच्या विद्यापीठातील प्राध्यापक जॉन हस याने वायक्लिफची हीच परंपरा पुढे चालविली. पोपने<noinclude></noinclude>
3wvstr8ar7h87qhcakthchqlogudtyb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८७
104
73543
230843
164590
2026-06-07T03:20:07Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230843
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४५९|| यशापयश-मीमांसा}}</noinclude>त्याला पकडून धर्मन्यायासनापुढे उभे केले. तेथे 'मी फक्त परमेश्वर व माझी विवेकबुद्धी यांनाच प्रमाण मानतो. तुम्ही म्हणता, शेकडो धर्माचार्यांचे मत माझ्या विरुद्ध आहे. असेल, लाखांचे असेल ! मी माझ्या विवेकाची साक्ष त्याहून मोठी मानतो' असे सांगून जॉन हसने, जिवंत जाळून मारण्याची पोपने दिलेली शिक्षा शांतपणे सोसली. पुढच्या शतकांत लूथर, कालव्हिन, क्रॅनमर, लॅटिमर यांनी अशाच धैर्याने ही चळवळ पुढे चालविली आणि जवळजवळ निम्मा पश्चिम युरोप पोपच्या अंध सत्ते- पासून मुक्त केला.

'''व्यक्तित्वाचे तत्त्वज्ञान'''
{{gap}}समाजप्रबोधनाची ही चळवळ म्हणजे भौतिकविद्येची, इहवादाची, व्यक्तिस्वातंत्र्याची, बुद्धिप्रामाण्याची चळवळ होती, हे वरील वर्णनावरून ध्यानात येईल. तसे व्यक्तिस्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान सांगणारे तत्त्ववेत्तेही या वेळी युरोपला लाभले. पदुआ नगरीचा पंडित मार्सिलिओ (१२७० - १३४०) हा या पंडितांचा मेरुमणी होय. तो पोपच्या सत्तेचा अगदी हाडवैरी होता. सर्व ख्रिस्ती जगातील लोकांच्या सार्वमताने पोपची निवड व्हावी व लोकांच्या सार्वमताचे त्याच्यावर पूर्ण नियंत्रण असावे, तो कर्तव्यच्युत, भ्रष्ट झाला तर त्याला पदच्युत करण्याचा अधिकार लोकांना असावा, असे मत त्याने मांडले. आणि ऐहिक क्षेत्रात पोपला कसलाही अधिकार असू नये, असा विचारही आपल्या ग्रंथात त्याने प्रतिपादिला. इंग्लंडमधील ओखॅमचा विल्यम हा असाच दुसरा तत्त्ववेत्ता होता. पोप हा नास्तिक आणि पाखंडी आहे, असे त्याने निर्भयपणे जाहीर केले. महाकवी डांटे आणि फ्रान्समधील पियरी डुबाईस हे असेच इहवादी, व्यक्तिवादी आणि बुद्धिप्रामाण्यवादी पंडित होते. कायदा व राजसंस्था या गोष्टी परमेश्वरप्रणीत नसून परिस्थिती व गरज याप्रमाणे त्या निर्माण होतात, म्हणून त्या पूर्ण मानवकृत आहेत, असे डुबाईस सांगत असे. तो प्लेटोचा अनुयायी असून स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच शिक्षण मिळाले पाहिजे, असा त्याचा आग्रह असे.

'''ग्रीक विद्या'''
{{gap}}पश्चिम युरोपात हे समाजप्रबोधन झाले त्याच्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे ग्रीक विद्या ही होय. मार्सिलिओ, विल्यम, डुबाईस हे सर्व ॲरिस्टॉटलचे शिष्य होते. पण ग्रीक विद्येच्या अभ्यासाला खरी चालना दिली ती इटालियन कवी पेट्रार्क (१३०४-७४) याने. त्याने व त्याच्या शिष्यांनी शाळा - महाशाळातून वर्ग चालवून, व्याख्याने देऊन, ग्रंथशाळा स्थापून या प्रभावी विद्येचे संस्कार सर्व पश्चिम युरोपीय देशांत लोकमानसावर करण्याचे अखंड प्रयत्न चालविले. मॅन्युएल क्रिसो लोरास, गाझा, लॉरेंझो, जोहान मुल्लर, इ. नावे यासाठी प्रसिद्ध आहेत. पंधराव्या शतकाच्या अखेरीस उदयास आलेले प्रसिद्ध मानवतावादी पंडित इरॅसमस, कॉलेट, थॉमस मूर यांनी ग्रीक विद्याप्रसाराचे<noinclude></noinclude>
ies4282wclt1zpmeu0pheqnyo6gsnvp
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८८
104
73544
230844
164591
2026-06-07T03:20:17Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230844
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४६०}}</noinclude>हेच व्रत पुढे चालविले आणि तमोयुगातून युरोपला मुक्त केले. मुक्त प्रज्ञा, स्वतंत्र निर्णयशक्ती, इहवाद, याच्या जोडीला सहिष्णुता, उदारमतवाद, समता, सामजिक न्याय, सर्वधर्मसमानत्व, प्रवृत्तिवाद, आशावाद यांचाही ते जोराने पुरस्कार करीत. या पंडितांत इरॅसमस हा मुकुटमणी असून सर्व पश्चिम युरोपाने त्याला गुरू मानले होते.

'''छापखाना'''
{{gap}}पेट्रार्कपासून इरॅसमसपर्यंत ग्रीक विद्येच्या प्रसाराचे जे कार्य सर्व पंडितांनी चालविले होते त्याला मोठा वेग आला तो मुद्रणकलेच्या शोधामुळे. जोहान गटेंबर्ग (१३९४- १४६८) या जर्मन तरुणाने हा शोध लावला. जर्मन मुद्रकांना छापखाना ही मोठी शक्ती आहे, क्रांतिकार्यात तिचे स्थान निस्तुळ आहे, असे वाटत असल्यामुळे मिशनऱ्यांच्या कर्तव्यबुद्धीने त्यांनी सर्व युरोपभर आपली कला पसरून दिली आणि पंधराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ९० लक्ष पुस्तके छापून काढली.

'''पाश्चात्यांपुढे !'''
{{gap}}बाराव्या तेराव्या शतकात फ्रेंच, जर्मन, इटालियन, इंग्लिश या भाषा प्रौढरूपाला आल्या आणि त्यातूनच आपण फ्रेंच, आपण जर्मन अशी स्वतंत्र राष्ट्रीय अस्मिता निर्माण झाली. या राष्ट्रभावनेचा परिपोष ग्रीक विद्येतील व्यक्तिवाद, बुद्धिस्वातंत्र्य, समता या तत्त्वांनी होऊन पश्चिम युरोपीय देश बलाढ्य व ऐश्वर्यसंपन्न झाले. भारतात त्याच सुमाराला प्रांतीय भाषा प्रौढ झाल्या होत्या. तरीही येथे स्वतंत्र राष्ट्रीय अस्मिता निर्माण झाली नाही. महाराष्ट्रात शिवसमर्थांच्या कार्यामुळे ती काही प्रमाणात उदयास आली होती. पण ग्रीक विद्येसारख्या भौतिक विद्यांचा प्रसार येथे झाला नाही. येथे शास्त्रज्ञ निर्माण झाले नाहीत, येथे जगप्रवास कोणी केला नाही, इहवादी तत्त्वज्ञान येथे कोणी सांगितले नाही, व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, समता यांची प्रवचने येथे कोणी केली नाहीत. शिवसमर्थांच्या कार्यामुळे जे चैतन्य, जी प्राणशक्ती येथे निर्माण झाली होती तिच्यामुळे मुस्लिम सत्तेचे निर्मूलन करण्याचे सामर्थ्य मराठ्यांना प्राप्त झाले. पण वरील गुणांनी संपन्न असे जे पाश्चात्त्य लोक त्यांच्याशी गाठ पडताच त्यांचा टिकाव लागला नाही, लागणे शक्यच नव्हते.

'''निवृत्ती'''
{{gap}}वरील प्रकारचे समाजप्रबोधन येथे झाले नाही याचे प्रधान कारण म्हणजे निवृत्ती. आद्य शंकराचार्यापासून पुढील सर्व आचार्य आणि भारतातल्या सर्व प्रदेशांतले संत यांनी, जग हे असार आहे, माया आहे, क्षणभंगुर आहे, हा संस्कार शतकानुशतके भारतीयांच्या मनावर करण्याचे व्रतच घेतले होते. या थोर पुरुषांनी संसाराची जी भयानक वर्णने केली आहेत, ती कानी पडल्यावर, या संसाराबद्दल कसलीही उभारी<noinclude></noinclude>
lpf40tv6xysyicbfcg259y14t0n3uh1
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८९
104
73545
230845
164592
2026-06-07T03:20:27Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230845
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४६१|| यशापयश-मीमांसा}}</noinclude>लोकांच्या मनात राहणे शक्यच नव्हते. संसारात राहावे, वनात जाऊ नये, असे यांतील अनेकांनी सांगितले आहे हे खरे. पण, धर्मशाळेत घडीभर राहातो तसे राहावे, त्याबद्दल कसलेही प्रेम मनात ठेवू नये, स्त्रीपुत्रांबद्दल कसलीही माया चित्तांत येऊ देऊ नये, त्यांच्याबद्दल घृणाच मनात असावी, मोक्ष, परलोक यांच्या मार्गात येणारे हे आपले वैरी आहेत हे सतत ध्यानी बाळगावे, असा उपदेश त्यांनी केला आहे. तो मनात ठसल्यावर, वीस वीस वर्षे ताऱ्यांचे वेध घेत राहावे, तपेच्या तपे वनस्पतींचे संशोधन करण्यात घालवावी, अनेक कागदपत्रे पाहून, दीर्घ अभ्यास करून आपल्या देशाचा इतिहास लिहावा, उत्तरधृवावर जावे, दक्षिण धृवाचा शोध घ्यावा, ही उभारी लोकांच्या चित्तांत कशी राहावी ? कारण हा सर्व अभ्यास या जगाचा आहे आणि ते जग तर क्षणभंगुर आहे, क्षणिक आहे, त्याचा घडीचाही भरंवसा नाही, त्याच्याबद्दल अगदी उत्तम ज्ञान झाले तरी त्याचा उपयोग काय ? स्त्रीपुत्रांचा अंतसमयी जसा उपयोग नाही, म्हणून त्यांची चिंता वाहणे हा जसा मूर्खपणा होय, तसाच या ज्ञानाचा अंतसमयी उपयोग नसल्यामुळे त्याचा हव्यास धरणे हा मूर्खपणाच होय. शाश्वत असा जो आत्मा, चिरंतन असे जे हरिचरण त्यांचे ज्ञान हेच मानवाचे प्राप्तव्य होय. म्हणून या जगाचा, तेथील ऐश्वर्याचा सर्व मोह सोडून, हरिनामस्मरण करीत कालक्रमणा करावी, यातच जन्माला आल्याचे साफल्य आहे, हे तत्त्वज्ञान पुराणे, कीर्तने, प्रवचने यांतून अहोरात्र ज्या लोकांच्या मनात बिंबवले जाते, त्यांच्या हातून ऐहिक ऐश्वर्याच्या कसल्याही क्षेत्रात पराक्रम होणे शक्य नाही. भारतात अनेक शतके हेच घडत होते. सातव्या आठव्या शतकाच्या आधी, भारतात ऐहिक ऐश्वर्याचे सर्व उद्योग होत होते. गणित, रसायन, पदार्थविज्ञान, वैद्यक इ. सर्व भौतिक विद्यांचा अभ्यास येथे होत होता. राज्य, साम्राज्य, व्यापार, उद्योग, कला, या क्षेत्रांतले सर्व उद्योग लोक करीत होते. आणि त्यामुळे भारत हा ऐश्वर्यसंपन्न झाला होता. तेथून पुढे या सर्वांना हळूहळू उतरती कळा लागली त्याचे प्रधान कारण निवृत्ती हे होय.

'''मध्यम वर्ग नाही'''
{{gap}}राष्ट्रभावना जोपासणे, लोकांच्या मनात ती रुजविणे, तिच्या सर्व अंगोपांगांचे विवेचन करणे, हे सर्व बुद्धिजीवी मध्यम वर्गाचे कार्य होय. वर सांगितलेले शास्त्र- संशोधक, ग्रंथकार, तत्त्ववेत्ते, मानवतावादी पंडित हे सर्व या मध्यम बुद्धिजीवी वर्गात येतात. राष्ट्रसंघटनेच्या सर्व कार्यात हा वर्ग नेतृत्व करीत असतो. पण हे उद्योगच भारतात कोणी न केल्यामुळे हा वर्ग येथे निर्माणच झाला नाही आणि त्याच्या अभावी काही काळ उदयास अलेली राष्ट्रभावना येथे मूळ धरू शकली नाही.

'''इतिहास- उपेक्षा'''
{{gap}}एक साधी गोष्ट पाहा. प्राचीन परंपरेचा, त्या परंपरेतील मानवी कर्तृत्वाचा अभि<noinclude></noinclude>
33aj37gz3ly6xgi0bxbz7cyzsp1xbmq
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९०
104
73546
230846
164593
2026-06-07T03:20:39Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230846
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४६२}}</noinclude>मान हा राष्ट्रनिष्ठेचा आत्मा होय. पण दुर्दैव असे की इतिहास लिहून या परंपरेचे ज्ञान जतन करून ठेवावे, हा उद्योगसुद्धा भारतात कोणी केला नाही. चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, विक्रमादित्य, हर्ष, सातवाहन असे महापराक्रमी राजे भारतात होऊन गेले, याचा उल्लेख, अकराव्या बाराव्या शतकानंतरच्या वाङ्मयात चुकून सुद्धा केलेला आढळत नाही. वेरूळ, अजंठ्याची लेणी सातव्या आठव्या शतकात पूर्ण झाली होती. पण इंग्रज येथे येईपर्यंत अशी काही लेणी आहेत, याचा भारतीयांना पत्ताच नव्हता. तीर्थे कोठे आहेत, देवळे कोठे आहेत, साधुसंन्यासी यांचे मठ कोठे आहेत, याची बारीकसारीक माहिती सर्व भारतीयांना होती. कारण त्यांचा मोक्षाशी, परलोकाशी संबंध होता. त्यामुळे अंतसमय मुखाचा होणार होता. चंद्रगुप्त, समुद्रगुप्त किंवा वेरूळ अजंठा यांच्यामुळे तो लाभ होणार नव्हता. त्यांच्यामुळे ऐहिक सुखाचा लाभ कदाचित झाला असता, पण ते तर विषवत् त्याज्य होते. मग त्या प्राचीन परंपरेचा इतिहास जतन करून ठेवण्याचे प्रयोजन काय ? राष्ट्रभावनेच्या परिपोषासाठी इतिहासाप्रमाणेच, राजनीतिशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, या विषयांवर ग्रंथ व्हावे लागतात. युरोपात तेराव्या शतकापासून असे ग्रंथ होऊ लागले होते. पण भारतात तसे झाले नाहीत. येथील लोकांना तशी प्रज्ञाच नव्हती असे नाही. ते याविषयी उदासीन होते. याचे महत्त्वच त्यांना वाटत नव्हते; कारण ते ऐहिक विषय होते. ते लिहून मोक्ष मिळणार नव्हता. त्या वेळचे शास्त्रीपंडित कशात गुंतले होते, हे मागे सांगितलेच आहे. व्रतवैकल्ये, श्राद्धपक्ष, प्रायश्चित्ते, हे त्यांचे आवडते विषय होते. हे बहामनी काळाविषयी झाले. पुढे शिवकाल आला. समर्थांनी ग्रंथ लिहून आणि छत्रपतींनी प्रत्यक्ष कार्य करून नव्या प्रेरणा दिल्या. पण शास्त्रीपंडितांच्यावर त्याचा काही परिणाम झाला काय ? गागाभट्ट, नीलकंठ चतुर्धर, रघुनाथ गणेश यांनी कोणते ग्रंथ लिहिले? मीमांसा कुसुमांजली, दिनकरोद्योत, आचारप्रदीप, भोजन- कुतूहल, धर्मामृतमहोदधी हे त्यांचे ग्रंथ. यांचे विषय वरील विषयांपेक्षा फारसे निराळे नाहीत. यांतले बहुतेक पंडित तीर्थयात्रा, शास्त्रचर्चा या निमित्ताने भारतभर भ्रमण करीत असत. पण मुस्लिमांचा, रजपुतांचा, विजयनगरचा इतिहास लिहावा, परकीय आक्रमकांचे स्वरूप, त्यांचे बलाबल या विषयावर लिहावे, असे त्यांना कधी वाटले नाही. मुस्लिम पंडितांनी असले लेखन केले आहे. इंग्रज प्रवाशांनी केले आहे. पण भारतीय पंडितांना ही बुद्धी झाली नाही, कारण या विषयांचा इहलोकाशी संबंध आहे, म्हणून हे विषय त्यांना वर्ज्य होते. निवृत्ती, मायावाद, परलोकनिष्ठा यांमुळे समाज कसा मृतवत होऊन जातो हे यावरून कळेल असे वाटते.

'''व्यापारी वर्ग'''
{{gap}}समाजप्रबोधन करणे हे प्रामुख्याने मध्यमवर्गाचे कार्य. तो वर्गच येथे निर्माण झाला नाही. त्यामुळे राष्ट्रनिष्ठेचा परिपोष येथे झाला नाही. राष्ट्रनिष्ठेचा आणि ऐहिक ऐश्वर्याचा<noinclude></noinclude>
1znhohb6kh4wawal74zyymr2d09tomu
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९१
104
73547
230847
164594
2026-06-07T03:20:51Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230847
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४६३|| यशापयश-मीमांसा}}</noinclude>परिपोष करणारा दुसरा वर्ग म्हणजे व्यापारी वर्ग होय. प्रोटेस्टंट पंथाच्या उदयानंतर पश्चिम युरोपातील व्यापारी वर्ग संघटित व प्रबळ झाला; आणि त्याने राजसत्तेवर वर्चस्व स्थापून सर्व जीवनातच क्रांती घडविली. हे व्यापारी केवळ व्यापारी नव्हते, ते राजकारणी होते, लढवय्ये होते, साम्राज्यकर्ते होते. त्यांनी आपल्या देशाच्या संरक्षणाला अवश्य ते धन निर्माण केले, शस्त्रास्त्रे उभारली व धनोत्पादनाला अवश्य ते विज्ञान पैदा करण्यासाठी विद्यापीठांना चालना दिली. म्हणजे त्यांनी एक नवी अभिनव अशी व्यापारी संस्कृतीच निर्माण केली. पोपच्या धर्माविरुद्ध बंड करण्यातही ते प्रमुख होते. सरंजामदारांचा पाडाव त्यांनीच केला आणि राष्ट्रीय राजसत्तेला त्यांनीच पाठिंबा दिला.

'''मराठा वैश्य ?'''
{{gap}}प्राचीन काळी भारतात व्यापारी वर्ग हा फार प्रबळ व संपन्न असा होता. पण पुढे त्यालाही उतरती कळा लागली आणि महाराष्ट्रातला व्यापारी वर्ग तर बहामनी काळात, दुर्गादेवीच्या दुष्काळात समूळ नाहीसाच झाला. या काळात सर्वच वर्ग उत्सन्न झाले होते. पण वतनदार, सरदार पुन्हा सावरले, शेतकरी पूर्ववत शेती करू लागला. पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही की या वेळी मराठा वैश्य जो नाहीसा झाला तो कायमचा ! त्यानंतर गुजराथी व मारवाडी वैश्ववाणीवर्ग महाराष्ट्रात आला आणि त्याने येथला सर्व व्यापारधंदा चालविला. तसाच उद्योग मराठा वैश्यवर्गालाही करता आला असता. पण तो वर्ग खचला तो खचलाच, आणि तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राचा व्यापार आणि उद्योग हा सर्व अमहाराष्ट्रीय लोकांच्या हाती गेलेला आहे.

'''साहुकार'''
{{gap}}शिवछत्रपतींनी व्यापाराला उत्तेजन देण्याचे पराकाष्ठेचे प्रयत्न केले होते. रामचंद्रपंत अमात्य यांनी 'आज्ञापत्रा'त छत्रपतींच्याच धोरणाचे विवेचन केले आहे. त्यावरून हे दिसून येईल. ते साहुकारांचे महत्त्व सांगतात. पण त्या वर्णनावरून स्वच्छ दिसते की साहुकार म्हणताना त्यांच्या मनात व्यापारीच आहेत. 'साहुकार म्हणजे राज्याची शोभा. त्यांच्या योगे राज्य अबादानसमृद्ध होते. न मिळे त्या वस्तुजात राज्यात येतात. संकटप्रसंगी कर्जवाम मिळते. याकरिता साहुकारांचा बहुमान चालवावा. पेठापेठात दुकाने, वखारी घालवून हत्ती घोडे, रेशमी वस्त्रे, जरीची वस्त्रे, लोकरी वस्त्रे, आदिकरून वस्त्रजात, तसेच रत्ने, शस्त्रे आदिकरून अशेष वस्तुजात यांचा उदीम व्यापार चालवावा. हुजूर बाजारामध्येही थोर थोर साहुकार आणून ठेवावे.' हे वर्णन केवळ व्याजबट्टा करणाऱ्या सावकाराचे नाही. व्यापारी सावकरांचे आहे. पुढे नवव्या प्रकरणात आरमाराचे महत्त्व सांगताना, समुद्रावरील व्यापाऱ्यांना असेच उत्तेजन संरक्षण द्यावे, असे अमात्यांनी सांगितले आहे. 'कोळी साहुकारांचे वाटेस जाऊ नये. प्रायोजनिक वस्तू परस्थळीहून आणावी तेव्हा येते. यात राज्याचा भ्रम काय उरला. ?'
<noinclude></noinclude>
4i5b5bo1ovc0ys5s9bvrkbohso645pe
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९२
104
73548
230848
164595
2026-06-07T03:21:01Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230848
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४६४}}</noinclude>
'''संरक्षक जकात'''
{{gap}}महाराजांनी लढाऊ गलबताप्रमाणेच व्यापारी गलबतेही बांधली होती आणि ती मस्कत, बसरा, इराण येथपर्यंत जात असत हे मागे सांगितलेच आहे. पण यापेक्षाही विशेष म्हणजे एकुणिसाव्या शतकात जर्मनीमध्ये फ्रेडरिक लिस्ट याने जे संरक्षक जकातीचे तत्त्व सांगितले ते महाराजांनी सतराव्या शतकात प्रत्यक्षात आणले होते. संगमेश्वर, पेण, पनवेल, कल्याण, भिवंडी येथे मोठमोठी मिठागरे होती. तेथील मीठ देशावर येत असे. पण पोर्तुगीजांच्या गोवा प्रांतात होणारे मीठ स्वस्त मिळत असे. त्यामुळे पेण पनवेलकडील मिठाचा व्यापार बसण्याची वेळ आली. त्या वेळी कुडाळचा सरसुभेदार नरहरी आनंदराऊ याला पत्र लिहून महाराजांनी गोव्यातील मिठावर जबर जकात बसवावी अशी आज्ञा केली. 'संगमेश्वराहून बारदेशचे मीठ महाग पडेल ऐसा जकातीचा तह देणे' असे त्यांचे शब्द आहेत.
{{gap}}या सर्वावरून व्यापार वाढवावा, त्यायोगे मराठा समाज समृद्ध व्हावा व स्वराज्याचा आर्थिक पाया भक्कम व्हावा, याची छत्रपतींना किती तळमळ होती हे दिसून येईल. पण येथल्या वैश्यवाणी समाजाने त्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला नाही. आणि राजश्रीची ही शोभा जी नष्ट झाली ती झालीच. मराठी स्वराज्यातही ती परत आली नाही. पेशवे कायमचे कर्जबाजारी असत. त्या वेळी साहुकार होते. पण ते व्याजबट्टा करणारे होते. व्यापारी नव्हते. महाराष्ट्राचे हे अंग तेव्हापासून लुळे झालेले आहे; त्यात पुन्हा जीव भरलाच नाही.

'''जातिभेद'''
{{gap}}येथे राष्ट्रभावना पोसली गेली नाही, लोकशाहीची तत्त्वे रुजली नाहीत, याचे दुसरे तितकेच महत्त्वाचे कारण म्हणजे जातिभेद हे होय. मराठी राज्यात व साम्राज्यात प्रत्यक्ष जातीय कलह झाले नाहीत, सर्व जातींतून सरदार सेनापती निर्माण झाले, त्यामुळे, जातिभेदामुळे स्वराज्याचे तसे काही नुकसान झाले नाही, असे काही पंडितांनी म्हटले आहे. पण हा फार मोठा गैरसमज आहे. कसा तो पाहा.

'''अंध बंधने'''
{{gap}}जातिभेदामुळे भारतात व महाराष्ट्रात व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य यांचा उदयच झाला नाही. युरोपात पोपची धर्मसत्ता, राजसत्तेप्रमाणेच अगदी संघटित अशी होती. तशी पुरोहितशाही येथे नव्हती. पण जातींच्या पंचायतींची सत्ता येथे त्या पोपच्या सत्तेपेक्षा दसपट बलिष्ठ होती. पोप एका व्यक्तीला फार तर जाळून मारीत असे. पण या जातिपंचायती सर्व कुटुंब आणि गणगोत यांवर बहिष्कार घालून त्यांना जीवनातूनच उठवीत असत; आणि ही जातिबंधने केवळ रोटीबंदी आणि बेटीबंदी एवढ्या-<noinclude></noinclude>
b0zwn879fhmrrl769kubk999w1m9xtb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९३
104
73549
230849
164596
2026-06-07T03:21:11Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230849
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४६५|| यशापयश-मीमांसा}}</noinclude>पुरतीच मर्यादित नसून, कोणत्या जातीने कोणत्या हाताने पाणी प्यावे, गंध कसे लावावे, धोतरे कशी नेसावी, स्त्रियांची वस्त्रे कशी असावी, येथपर्यंत जीवनाच्या सर्व व्यापारांपर्यंत ती आवळलेली असत. कुंभारात दोन जाती आहेत. लग्नामध्ये मिरवणुकीत बायकांनी डोक्यावर पाण्याने भरलेला घडा घेण्याचा अधिकार एका जातीला आहे, दुसरीला नाही. या नियमाचे उल्लंघन होताच मारामाऱ्या होऊन ते खटले पेशव्यांपर्यंत आलेले आहेत. वडाऱ्यांच्या काही जातीत स्त्रिया चोळी वापरीत नाहीत. तशी काही स्त्रियांनी वापरताच त्यांचे खून पडले. ही हकीकत पंचवीस वर्षापूर्वीचीच आहे. कोणत्या जातीने मांतीची भांडी, कोणत्या जातीने तांब्याची वा पितळची भांडी वापरावी हे ठरलेले आहे आणि ती बंधने पोपच्या बंधनांपेक्षा आजही जास्त बळकट आहेत.

'''व्यक्तित्व नाही'''
{{gap}}अशी अविवेकी, अर्थशून्य, कार्यकारणहीन बंधने ज्या समाजात आहेत त्या समाजात व्यक्तिस्वातंत्र्य, विवेकनिष्ठा, बुद्धिप्रामाण्य यांचा उदय होणे शक्य नाही. आणि व्यक्तिस्वातंत्र्य नाही म्हणजे व्यक्तित्व नाही, व्यक्तीला पृथकपणा नाही. व्यक्तीच्या पृथक्-पणातूनच, व्यक्तित्वातूनच सर्व मानवी कर्तृत्वाचा उदय होत असतो. आणि अशा व्यक्ती याच राष्ट्रसंघटना व लोकसत्ता यांचा आधार असतात. कारण या व्यक्तीच नवे संशोधन करू शकतात, नवे तत्त्वज्ञान सांगू शकतात, नवे सिद्धात मांडू शकतात. असे स्वातंत्र्य मिळाल्यावाचून रसायन, पदार्थविज्ञान, जीवशास्त्र यांची प्रगती अशक्य आहे. युरोपात दीर्घकाळ ग्रीक वैद्यकच रूढ होते. पण प्रबोधन-युगात बुद्धिस्वातंत्र्य येताच मानवी शरीराचा नव्याने अभ्यास करण्याचे साहस लोक करू लागले. त्यासाठी स्मशानात पुरलेली प्रेते ते गुपचूप आणीत व त्यांची चिरफाड करीत. प्रेताची चिरफाड करणे हे ख्रिस्ती धर्माला मंजूर नव्हते. धर्मपीठे त्या गुन्ह्याला जबर शिक्षा करीत. पण तरीही लोकांनी ते साहस केले आणि आयुर्विद्येची प्रगती केली. पाश्चरला, जंतूमुळे रोग होतात, हे सांगण्याबद्दल शिक्षा होण्याची वेळ आली होती. आणि बायबलविरुद्ध विकासवाद प्रस्थापित करण्याबद्दल डार्विनवर भयंकर गहजब झाला होता. असे असूनही युरोपीय अभ्यासकांनी आपले विद्याप्रेम सोडले नाही. वाटेल त्या यातना, मृत्युदंडही सोसून सत्यसंशोधन चालवायचे असा निर्धार त्यांनी केला म्हणून युरोपला ऐश्वर्य प्राप्त झाले. भारतात हे साहस कोणी केले नाही. त्यामुळे या समाजात माणसाचे मन सदैव बद्ध, जखडलेले आणि त्यामुळे प्रज्ञाहीन असेच राहिले. कलियुग कल्पना, समुद्रगमननिषेध, पतितपरावर्तनाचा निषेध यांनी या समाजाची सर्व प्रगती खुंटली होती. शिवछत्रपतींनी या शृंखलांवर घाव घातला होता. पण यामुळे समाजाचा नाश कसा होतो ते दाखवून सर्व समाजात छत्रपतींच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य, ग्रंथ लिहिण्याचे कार्य, कोणी केले नाही. समुद्रगमनाला शास्त्रात त्या वेळी देहान्त<noinclude>
{{gap}}३०</noinclude>
7ah1xbj8pdm53nudk4u7aeedaprjshf
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९४
104
73550
230850
164597
2026-06-07T03:21:25Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230850
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४६६}}</noinclude>प्रायश्चित्त होते. पण त्यापेक्षाही फार भयंकर असे जातिबहिष्काराचे प्रायश्रित्त होते. परदेशात मनुष्य इतर जातीबरोबर जेवणार, त्यांच्या हातचे खाणार, आणि त्यामुळे त्याची जात बाटणार, म्हणून जातिपंचायती त्या माणसावर बहिष्कार टाकीत. त्यामुळे परदेशात जाऊन राहणे, तेथे विद्या शिकणे, व्यापार करणे असले साहस करण्यास कोणी धजत नसे. जातिभेद हा या देशाला असा घातक ठरलेला आहे. त्यामुळे समाज व्यक्तिस्वातंत्र्याची जोपासना करू शकला नाही आणि प्रत्येक मनुष्य कळपातला एक घटक, असाच राहिला. तो व्यक्ती या पदवीला गेलाच नाही. त्यामुळे विद्या, कला, शास्त्रे, व्यापार, उद्योग, या सर्वाचा लोप होऊन अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य या नरकात तो दीर्घकाल पिचत राहिला.

'''पुराणवर्चस्व'''
{{gap}}निवृत्ती आणि जातिभेद यांच्याइतकेच भारतीयांच्या अवनतीचे, तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या मनावरील पुराणवर्चस्व हे होय. या वर्चस्वामुळे वास्तव जगापासून मनाने हिंदुलोक फार दूर गेले. इतिहास भूगोल या कल्पनाच त्यांच्या मनातून नाहीशा झाल्या. पश्चात्य लोक जगप्रवास करीत असताना, नवखंड पृथ्वी व दहावे खंड काशी, असा भारतीयांचा भूगोल होता. आणि उन्नती, अवनती, जय, पराजय, उत्कर्षापकर्ष हे सर्व पापपुण्यामुळे, दैवयोगाने, परमेश्वरी इच्छेने घडत असते ही त्यांची ऐतिहासिक घडामोडींची मीमांसा होती. याच वेळी युरोपात कार्यकारणभावाचा अभ्यास चालू झाला होता आणि सर्व घडामोडींची त्याअन्वये मीमांसा होऊ लागली होती. भारतात लोकहितवादींच्या काळापर्यंत, पूर्वी रावण मातला होता तसेच आता इंग्रज मातले आहेत, रामाने अवतार घेऊन रावणाचा नाश केला तसा इंग्रजांचाही नाश परमेश्वर अवतार घेऊन करील, अशी लोकांची श्रद्धा होती. कारण पुराणांत तशी वर्णने आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये मुळात खूपच वास्तववादी आहेत. 'मी मानवी प्रयत्नाने रावणाचा वध केला आहे,' असे रामचंद्र म्हणतात. राम, सीता, पांडव, द्रौपदी, श्रीकृष्ण, त्यांच्या स्त्रिया यांचे मूळ काव्यात अत्यंत दुःखद शेवट झालेले दिसतात. पण असे दुःखद शेवट होऊच द्यावयाचे नाहीत, असा पुराणांचा कटाक्ष आहे. त्यासाठी त्यांनी शंकरपार्वतीची योजना केली आहे. हरिश्चंद्र, श्रियाळ, मार्केंडेय यांच्यावर कसलीही संकटे येवोत, शंकर त्यांना शेवटी सोडवितात. अंबरीष, प्रल्हाद, ध्रुव यांना विष्णू सोडवितात. रामायण, महाभारत यांतील अनेक घटनांचे मूळ स्वरूप बदलून पुराणिकांनी आणि पुढे प्राकृतभाषांतील लेखकांनी त्यांना परमेश्वरी चमत्कारांचे रूप देऊन टाकले आहे. रामाने सेतू बांधला तो दगड, माती, झाडे आणून साध्या मानवी प्रयत्नांनी बांधला, असे रामायणात आहे. पण रामनामामुळे दगड तरले, असे त्यांचे पुराणात चमत्काररूप आहे. मूळ रामायण आणि महाभारत मराठीत किंवा इतर प्राकृत भाषांत कोणी आणलेच नाही. अनेक<noinclude></noinclude>
096dfoucuquklkvk2ck8coqwtsazj2u
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९५
104
73551
230851
164598
2026-06-07T03:21:42Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230851
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४६७|| यशापयश-मीमांसा}}</noinclude>संस्कृत पंडितांनीच त्यांची पुराणे करून टाकली होती, रामकृष्णांच्या लीला असे त्यांना रूप दिले होते. मराठीत ती पुराणेच आली. महाभारताच्या शांतिपर्वात राजनीती, व्यापार, शेती, ऐतिहासिक घडामोडी यांचे वास्तव दृष्टीने, कार्यकारणभावाचा बोज राखून वर्णन केलेले आहे. पण त्याचे एक अक्षरही मराठी कवींनी किंवा संतांनी मराठीत आणलेले नाही. जे घडते ते रामकृष्णांच्या लीलांमुळे घडते, मानवी प्रयत्नामुळे नव्हे, असेच सांगण्याचा त्यांचा हेतू आहे. संत चरित्रकारांनी हेच केले आहे. सर्व संतांचा समाजाने छळ केला, पण प्रत्येक वेळी परमेश्वराने चमत्कार करून त्यांना सोडविले, अशीच सर्वत्र वर्णने आहेत. मराठी मनाचे पोषण अशा पुराण-कथांवर होत होते. असे मन नेहमीच दुबळे व कर्तृत्वहीन राहते. भारतातील अनेक प्रदेश दीर्घकाळ पारतंत्र्यात राहिले, त्याचे कारण चमत्कारनिष्ठ, दुबळे, भोळेभाबडे, असे हे मनच आहे. शिवसमर्थांच्यासारखे, विद्यारण्य हरिहरबुक्कांसारखे थोर पुरुष ज्या प्रदेशात निर्माण झाले, तेथे काही काळ मानव पराक्रमी झाला. 'पुरुष प्रयत्न बलवत्तर,' असे छत्रपती म्हणाले, 'केल्याने होत आहे रे,' 'शक्तीने मिळती राज्ये,' असे समर्थांनी सांगितले आणि लिहिलेही. तेवढ्यापुरते येथे चैतन्य निर्माण झाले. पण वर सांगितलेच आहे की हे एकट्यादुकट्याचे कार्य नाही. महाराष्ट्रात वा अन्यत्र जी कीर्तन, प्रवचने चालत ती सर्व पुराणकथांची, पुराणतत्त्वज्ञानाची चालत. ज्या वेळी पश्चिम युरोपात सर्व भाषांतील प्राध्यापक, पंडित, धर्मसुधारक ग्रीकविद्येची प्रवचने, कीर्तने करीत होते त्या वेळी भारतात, महाराष्ट्रात दौपदीला वस्त्रे नेसविली, खांब फोडून देव प्रगट झाले, भिंत चालविली, देऊळ फिरविले, अशी कीर्तने होत होती. अशा कीर्तनांतून समाजप्रबोधन होत नाही. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य, इहवाद, प्रयत्नवाद यांना चालना मिळत नाही. धर्मग्रंथांचा, सनातनशास्त्रांचा कितीही विरोध असला तरी, विवेकाला दिसले ते सत्य सांगण्याचे धैर्य मानवी मनाला लाभत नाही. तशा धैर्यावाचून राष्ट्रनिष्ठा, लोकसत्ता, यांची मूलतत्त्वे समाजात रुजविणे अशक्य असते.

'''अपयश का ?'''
{{gap}}शिवछत्रपतींच्या कार्याचे मागील काही प्रकरणांत जे विवेचन केले आहे त्यावरून समाजप्रबोधनाची काही तत्त्वे त्यांनी आपल्या मनाशी निश्चित केली होती हे दिसून येईल. समर्थांनीही अशीच आणखी काही तत्त्वे जाणली होती आणि त्यांचे थोडे विवेचनही केले होते. त्यामुळेच येथे प्रयत्नवाद, स्वातंत्र्यप्रेम, विजीगिषा, ऐश्वर्याकांक्षा, प्रवृत्तिधर्म, यांचा उदय होऊन लोकांत राष्ट्रकल्पनेचा प्रादुर्भाव होत होता. त्यामुळेच स्वराज्यस्थापनेचे कार्य शिवछत्रपतींना यशस्वारीत्या करता आले. पण या दोन पुरुषांना, त्यांचे कार्य पुढे चालविणारे, समर्थ वारस लाभले नाहीत; आणि आमूलाग्र समाजपरिवर्तन होण्यासाठी जे समाजप्रबोधन अवश्य होते ते घडवून आणणारे शेकडाे शास्त्रज्ञ, प्रवासी, तत्त्ववेत्ते, प्रवचनकार, वक्ते येथे झाले नाहीत. त्यामुळे<noinclude></noinclude>
2kn8y5qfvsfu87qbivxufhhstwb3owq
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९६
104
73552
230852
164599
2026-06-07T03:21:55Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230852
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४६८}}</noinclude>क्रांतीची बीजे या भूमीत पेरली तरी अवश्य ते खतपाणी न मिळाल्यामुळे ती रुजली नाहीत, त्यांना विरूढी फुटली नाहीत, त्यांना कोंब आले नाहीत. पश्चिम युरोपातल्या इंग्लंड, फ्रान्स या देशांप्रमाणे महाराष्ट्र बलसंपन्न आणि ऐश्वर्यशाली का झाला नाही याची कारणमीमांसा ही अशी आहे.
{{gap}}महाराष्ट्र-संस्कृतीचा इतिहास सांगताना, बहामनी कालानंतर मराठा कालाच्या, मराठा युगाच्या विवेचनास आपण प्रारंभ केला. आणि प्रथम या युगाचे आद्यप्रवर्तक जे शिवछत्रपती त्यांच्या कार्याचे येथवर विवेचन केले. त्यावरून हे दिसून येईल की त्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या इतिहासालाही नवे वळण लावले, त्या इतिहासातही नवे युग निर्माण केले. त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांच्या ठायी त्यांच्यासारखी प्रज्ञा नव्हती, तसे कर्तृत्व नव्हते. पण मराठा समाजात एक नवे चैतन्य निर्माण झाले होते यात शंकाच नाही. त्याच बळावर, आपल्या सर्वसामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाचे भारताच्या इस्लामीकरणाचे स्वप्न त्यांनी धुळीस मिळविले आणि माेगली सत्तेचा कणाच मोडून टाकला. आणि त्याच बळावर पुढे मराठ्यांनी आपल्या स्वराज्याचे साम्राज्य केले. अशा या पुढल्या काळातल्या महाराष्ट्रसंस्कृतीचा, तिच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक अंगांचा इतिहास आता पाहावयाचा आहे.

{{center|■}}<noinclude></noinclude>
hiwmzp2qnyz0gr34ffr0u3hmziimnj7
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९७
104
73553
230853
164600
2026-06-07T03:22:12Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230853
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 497
|bSize = 402
|cWidth = 294
|cHeight = 153
|oTop = 71
|oLeft = 47
|Location = center
|Description =

{{rh|'''२४.'''||'''स्वातंत्र्ययुद्ध'''}}

{{gap}}मराठा कालातील महाराष्ट्राच्या संस्कृतीचे स्वरूप आपण अभ्यासीत आहो. या मराठा कालाचे साधारणपणे तीन खंड होतात. १६४५ ते १६८० हा पहिला शिवछत्रपतींचा कालखंड होय. १६८१ ते १७०७ हा दुसरा स्वातंत्र्य युद्धाचा कालखंड होय. यालाच अलीकडे जनतायुद्ध असे म्हणतात. आणि १७०७ ते १८१८ हा तिसरा पेशवाईचा कालखंड होय.
{{gap}}
यातील पहिल्या कालखंडातील संस्कृतीच्या विविध अंगांचा विचार आपण गेल्या पाच लेखांत केला. शिवछत्रपतींनी फार मोठे धर्मपरिवर्तन घडविले, काही नवी अर्थव्यवस्था अमलात आणली, या देशाला राष्ट्रधर्माची दीक्षा दिली आणि नवी युद्धविद्या जनतेला शिकवून या महाराष्ट्रभूमीत स्वराज्याची स्थापना केली. पण या कालातील विद्वज्जनांनी त्यांच्या कार्यामागचे नवे तत्त्वज्ञान ग्रंथरूपाने लोकांपुढे मांडण्याचे व जनमानसात ते बिंबविण्याचे कार्य केले नाही; म्हणून छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या ज्या आकांक्षा होत्या त्या व्हाव्या तशा सफल झाल्या नाहीत, असा त्या विवेचनाचा इत्यर्थ आहे.
{{gap}}आता 'स्वातंत्र्ययुद्ध' हा जो दुसरा कालखंड त्याचा अभ्यास करावयाचा आहे.

'''औरंगजेब-आकांक्षा'''
{{gap}}मोगल बादशहा औरंगजेब हा १६८२ च्या मार्च महिन्यात औरंगाबादेस येऊन पोचला. काबूलपासून कन्याकुमारीपर्यंत एकछत्री मोगल सत्ता प्रस्थापित करावयाची आणि सर्व हिंदुस्थान इस्लामधर्मी करून टाकावयाचा, अशी त्यांची आकांक्षा होती.<noinclude></noinclude>
sdt3xvak32gxa9ozeictiyu07e44dy1
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९८
104
73554
230854
164601
2026-06-07T03:25:01Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230854
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४७०}}</noinclude>त्याच्या बरोबर शहा आलम, अजन शहा, कामबक्ष हे त्याचे पुत्र बहादूरखान, शिवाबुद्दिनखान, हसनअल्ली, खावजहान, रणमस्तखान, रुहुल्लाखान, दिलेरखान, वजीर आसदखान यांसारखे मोठमोठे सरदार; चार पाच लाख लष्कर, भरपूर तोफा व दारूगोळा; असा प्रचंड, पोस्त सरंजाम त्याने आणला होता. शिवाजीच्या मृत्यूनंतर त्याने स्थापलेले स्वराज्य आपण चुटकीसरसे नष्ट करू, नंतर विजापूर व गोवळकोंडा येथील शियापंथी शाह्या जिंकू आणि मोगली साम्राज्याचे पूर्वजांचे स्वप्न साकार करून दाखवू, अशी फार मोठी उमेद धरून तो दक्षिणेत उतरला होता. हे सर्व कार्य अल्पावधीत, दोन चार वर्षांत, फार तर सात आठ वर्षांत उरकून, दिल्लीला परत जावयाचे असा त्याचा संकल्प होता.
{{gap}}पण औरंगजेब दिल्लीला परत जाऊ शकला नाही. पंचवीस वर्षे सतत युद्ध करूनही त्याला अपेक्षेच्या शतांशही यश आले नाही. त्याचे सर्व मनोरथ धुळीस मिळाले, आणि पूर्ण निराश होऊन १७०७ च्या फेब्रुवारी महिन्यात तो कालवश झाला.

'''तेव्हा आणि आता'''
{{gap}}या आधीच्या सातशे वर्षाच्या काळात भारतावर- उत्तर भारतावर, दक्षिण भारता वर, पूर्व भारतावर, पश्चिम भारतावर- मुस्लिमांच्या सारख्या स्वाऱ्या होतच होत्या. त्या स्वाऱ्या आणि ही औरंगजेबाची स्वारी यांची तुलना केली तर काय दिसेल ? अकराव्या शतकाच्या पहिल्या चतुर्थात गझनीच्या महंमदाने हिंदुस्थानवर सतरा स्वाऱ्या केल्या. एकदाही त्याचा पराभव झाला नाही ! पुढच्या तीनशे वर्षात मुसलमानांनी सर्व उत्तर हिंदुस्थान पादाक्रांत केला. चौदाव्या शतकाच्या प्रारंभी अल्लाउद्दिन व मलिककाफूर यांनी पाचसहा स्वाऱ्यांत सर्व दक्षिण हिंदुस्थान— तेथील सर्व मोठमोठी राज्ये धुळीस मिळविली. पुढे महाराष्ट्रात हसन गंगू आला आणि त्याने अगदी सहजगत्या येथे स्वतंत्र राज्य स्थापिले. आणि तीनशे वर्षे हिंदूंना, मराठ्यांना गुलामगिरीत ठेविले. अशी ही पूर्वीची स्थिती. एकेका स्वारीत एकेक दोन दोन राज्ये मुस्लिम बादशहा किंवा सेनापती सहज उद्ध्वस्त करीत असत. आणि आता ! मुस्लिमांचा सर्वात मोठा, सर्वात बलशाली बादशहा दिल्लीच्या सर्वसामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरला होता आणि पंचवीस वर्षे, पाव शतक, लढाया करीत होता. त्याला काय मिळाले ? व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो, 'महाराष्ट्राने औरंगजेबाच्या देहावरच थडगे रचले नाही तर त्याच्या साम्राज्यावरही !' यदुनाथ सरकार म्हणतात, 'महाराष्ट्राने केवळ औरंगजेबाचेच कार्य नव्हे, तर त्याच्या पूर्वजांचे कार्यही, शून्यवत करून टाकले.'
{{gap}}हे एवढे बळ, हे अद्भुत सामर्थ्य मराठ्यांना कोठून प्राप्त झाले ? त्या एवढ्या बलशाली शत्रूवर त्यांनी जय कसा मिळविला ? हे शिवछत्रपतींचे देणे आहेत, हा त्यांचा वारसा आहे, हे उघडच आहे. हा वारसा त्यांनी कसा चालविला हे आता पाहावयाचे आहे.
<noinclude></noinclude>
omp2vltfr5mgd65l1pwnkw6s62viutj
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९९
104
73555
230855
164602
2026-06-07T03:25:12Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230855
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४७१|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>
'''राजघराणे दुंभगले'''
{{gap}}स्वातंत्र्ययुद्धाच्या पहिल्या नऊ वर्षाच्या काळात छत्रपती संभाजी हेच मराठ्यांचे नेते होते. त्यांच्या नेतृत्वात प्रारंभीच काही उणेपणा आला होता हे खरे. पण तरीही त्यांनी नऊ वर्षे जो पराक्रम केला तो त्यांना भूषणावह आहे. इ. स. १६७८ च्या अखेरीस शिवछत्रपती असतानाच ते दिलेरखानाला जाऊन मिळाले होते. त्यामुळे शिवछत्रपतींना मरणप्राय दुःख झाले. कारण तो त्यांच्या सर्व कार्याचा, तत्त्वज्ञानाचा, राष्ट्रधर्माचा दारुण पराभव होता. शिवाय त्यामुळे मंत्रिमंडळाचा संभाजीराजांवरचा विश्वास उडाला आणि सत्तेच्या शिखरस्थानातच दुही निर्माण झाली. संभाजी महाराजांना काही न कळवता सोयराबाई, मोरोपंत पिंगळे आणि अनाजी दत्तो यांनी कारस्थान रचून राजारामाला राज्याभिषेक केला. संभाजीनी हा सर्व बनाव मोडून काढला आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे कटातल्या सर्व लोकांना उदार मनाने माफी देऊन पुन्हा स्वपदावर नेमून टाकले. पण सोयराबाई - पक्षाने पुन्हा कारस्थान रचले. पहिले कारस्थान कितीही क्षम्य किंवा समर्थनीय असले तरी दुसरे अगदी अक्षम्य होते. सोयराबाईला नसला तरी मंत्र्यांना हा विवेक असायला हवा होता. राजाराम प्रौढ असता, कर्तबगार असता, त्याच्या ठायी नेतृत्वाचे उत्तम गुण दिसत असते तर गोष्ट वेगळी होती. पण तसे काही नसताना, अनाजी दत्तो प्रभृतींनी आपल्या सामर्थ्याचा हिशेब न करता, पुन्हा कारस्थान रचले. यामुळे राजघराणे दुभंगले आणि महाराष्ट्र कायमचा दुभंगला.
{{gap}}संभाजी महाराजांचा या कारस्थानामुळे तोल सुटला असला तर त्यांना दोष देता येणार नाही. तरीही एक गोष्ट खरीच आहे की मोठमोठे कर्ते पुरुष त्यांनी मारून टाकल्यामुळे, मराठ्यांचे सामर्थ्य खच्ची झाले. पण अशाही परिस्थितीत, औरंगजेबासारख्या मोठ्या शत्रूला त्यांनी आठ वर्षे खडे चारले, ही गोष्ट प्रारंभी म्हटल्याप्रमाणे, त्यांना भूषणावह आहे.

'''विविध शत्रू'''
{{gap}}मोगल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचा आणि हिंदवी स्वराज्याचा सर्वात मोठा शत्रू. पण तो एकच शत्रू नव्हता. सिद्दी आणि पोर्तुगीज हेही आणखी शत्रु होते. आकारमानाने ते लहान होते, पण ते अत्यंत चिवट असून औरंगजेबाचा त्यांना सतत पाठिंबा होता. अशा या त्रिविध शत्रूंनी शिवछत्रपती कालावश होताच फार मोठी मोहीम मांडली. या मोहिमेचा थोडा तपशील समजला म्हणजे छत्रपती संभाजींच्या कर्तृत्वाची सम्यक कल्पना आपल्याला येईल व शिवछत्रपतींच्या युद्धविद्येचा वारसा त्यांनी कसा चालविला ते कळून येईल.
<noinclude></noinclude>
lz7wdw69jy6glj3qird4nsqyetr1khg
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५००
104
73556
230856
164603
2026-06-07T03:25:24Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230856
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४७२}}</noinclude>
'''मोगल मोहीम'''
{{gap}}शिवछत्रपती गेल्यानंतर दोन महिन्यांतच मोगलांच्या या प्रचंड मोहिमेला प्रारंभ झाला. औरंगजेब त्या वेळी राजपुतान्यात होता. त्याने तेथून खान बहादूरखान यास दक्षिणेत पाठविले आणि खानाने आल्याबरोबर जुलै १६८० मध्येच चांदवडजवळच्या अहिवंत या किल्ल्याला वेढा घातला. तेथून पुढे त्या परिसरात त्याचा संचार सतत चालूच होता. याच वेळी औरंगजेबाचा दुसरा सरदार रणमस्तखान हा बहाद्दूरखानाच्या मदतीला होताच. १६८१ च्या नोव्हेंबर महिन्यात शहाबुद्दिनखान याने दक्षिणेत येऊन साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. १६८१ च्या एप्रिल महिन्यात नाशिक जिल्ह्यात मोगलांच्या आक्रमक हालचाली सुरू झाल्या होत्या. चौथा एक सरदार हसन अल्लीखान याला १६८१ सालीच औरंगजेबाने रवाना केले होते. उत्तर कोकणात उतरून तो मुलूख काबीज करावा, असा त्याला हुकूम होता. १६८२ च्या मार्चमध्ये स्वतः बादशहा औरंगाबादेस येऊन पोचला. लगेच त्याने दिलेरखानास नगरकडे आणि शहाबुद्दिन यास नाशिककडे पाठविले. शहाबुद्दिनाने एप्रिलात रामशेज किल्ल्याला वेढा घातला आणि पुढे सरदारांच्या पुनः पुन्हा बैठकी घेऊन त्यांच्या वारंवार बदल्या करून औरंगजेबाने ही मोहीम अखंड चालू ठेवली.

'''सिद्दी, पोर्तुगीज'''
{{gap}}अशा रीतीने सर्व महाराष्ट्रभर मोगलांनी आक्रमणास प्रारंभ केला होता. पण मागे सांगितल्याप्रमाणे मराठ्यांचा हा एकच शत्रू नव्हता. सिद्दी आणि पोर्तुगीज हे आणखी दोन प्रबळ शत्रू होते. त्यांनीही याच काळात मराठी मुलूख उद्ध्वस्त करण्यास प्रारंभ केला. सिद्दी कासम याने तर कोकणात अगदी अनर्थ चालविला होता. तो माणसे पकडून त्यांना गुलाम म्हणून विकी, हाती सापडलेल्यांच्या कत्तलीही करी; जाळपोळ, बलात्कार हा नित्याचाच प्रकार होता. १६८० च्या ऑगस्टपासूनच त्याने या विध्वंसाला प्रारंभ केला होता १६८१ च्या डिसेंबरात पनवेलपासून चौलपर्यंतच्या मुलखात त्याने धुमाकूळ घातला होता. पोर्तुगीजांचे आक्रमणही याच वेळी सुरू झाले होते. सिंधुदुर्गाशेजारचे जे अंजदीव बेट त्यावर संभाजी महाराजांनी किल्ला बांधण्याचे ठरवून तटबंदी सुरू केली. पण पोर्तुगीजांनी त्यावर स्वारी करून अंजदीव बेट हस्तगत केले. १६८२ मध्ये रणमस्तखान उत्तर कोकणात उतरला असता संभाजी महाराजांनी त्याचा कोंडमारा केला होता. पण त्याला पोर्तुगीजांनी धान्यसामग्री पोचविली. नाही तर खानावर कठीण प्रसंग आला होता. पुढच्या वर्षी जंगी तयारी करून पोर्तुगीजांनी स्वतःच आक्रमण करून महाराजांच्या फोंडा किल्ल्यास वेढा घातला (ऑक्टोबर १६८३).
<noinclude></noinclude>
0i5662eg3leo053rh7wotjnujq63kcd
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०१
104
73557
230857
164605
2026-06-07T03:25:36Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230857
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४७३|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>
'''शहा आलम'''
{{gap}}पोर्तुगीज आणि मराठे यांची ही फोंड्याची लढाई चालू असतानाच १६८३ च्या डिसेंबरात बादशहाने फार प्रचंड सरंजाम उभा करून शहाजादा शहा आलम यास रामघाटाने कोकणात रवाना केले. दुसरी फौज तयार करून शियाबुद्दिनखान पुण्यावर चालून गेला. आणि शहाजादा अजमशहा हा नाशिकच्या रोखाने निघाला. विजापूर गोवळकोंडा यांच्याकडून मराठ्यांना मदत येऊ नये म्हणून या बाजूला खान जहान याची नेमणूक बादशहाने केली आणि पोर्तुगीजांनाही निरोप धाडला की तुम्ही संभाजीशी कसून युद्ध करा. आमची फौज मदतीस येत आहेच. शहा आलमच्या येणाऱ्या या फौजेला धान्य व दारूगोळा पुरविण्याची जबाबदारी पोर्तुगीजांनी पत्करली.
{{gap}}१६८० च्या एप्रिलपासून तब्बल चार वर्षे मराठ्यांच्या लहानशा स्वराज्यावर अशी ही आक्रमणे चालू होती. एकाच वेळी दोन दोन तीन तीन ठिकाणी स्वाऱ्या होत होत्या आणि विशेष म्हणजे मोगल, पोर्तुगीज व सिद्दी हे आक्रमक एकमेकांना सामील होते. सिद्दी तर बादशहाचा नोकरच होता. पण पोर्तुगीज नोकर नसले तरी औरंगजेबाचे हुकूम मोडणे त्यांना अशक्य होते. असे हे संगनमत असल्यामुळे या आक्रमणाला फार भयानक असे रूप प्राप्त झाले होते.
{{gap}}या आक्रमणाला संभाजी महाराजांनी, मराठ्यांनी तोंड कसे दिले ?

'''कडवा प्रतिकार'''
{{gap}}१६८० मध्ये बहादूरखानाने अहिवंत किल्ल्याला वेढा घातला. पण मराठ्यांनी यशस्वीपणे तोंड दिल्यामुले त्याला तो वेढा उठवावा लागला. १६८१ च्या अखेरीस साल्हेरच्या वेढ्याची तीच गत झाली. हा किल्ला पुढे पाच वर्षे मोगलांच्या हाती लागला नाही. १६८६ च्या अखेरीस हा किल्ला पडला आणि तोही फितुरीमुळे ! १६८२ च्या एप्रिलात शहाबुद्दिनाने रामशेजला वेढा घातला होता. तोही किल्ला पडला नाही. तो पडला १६८७ साली आणि तोही फितुरीने ! पण केवळ बचावाचे धोरण अवलंबूनच मराठे स्वस्थ बसले नव्हते. बहादूरखान अहिवंताच्या परिसरात असतानाच सेनापती हंबीरराव मोहिते याने धरणगाव लुटून बऱ्हाणपुरावर चाल केली व भोवताली लुटालूट करून लाखो रुपयांची मत्ता पैदा केली. याच वेळी संभाजीमहाराजांनी दुसरी एक मोठी फौज अहमदनगर पैठण मार्गाने औरंगाबादेवर धाडली. या झाल्या मुख्य फौजा. शिवाय मराठ्यांच्या अनेक टोळया मोंगली मुलखात शिरून तो प्रदेश उद्ध्वस्त करीत होत्या. १६८१ साली नेताजी पालकर बागलाणात शिरला व तेथे उच्छेद करू लागला. दुसरी एक फौज सोलापुरावर व तिसरी साल्हेरकडे चालून आली.
{{gap}}१६८२ च्या प्रारंभी हसन अल्लीने कोकणात उतरून कल्याण काबीज केले. पण त्याची पाठ वळताच मराठ्यांनी ते परत घेतले. याच साली नोव्हेंबर महिन्यात रण-<noinclude></noinclude>
afg2cew81ia2q167qawa0z54jy29ktm
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०२
104
73558
230858
164607
2026-06-07T03:25:49Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230858
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४७४}}</noinclude>मस्तखानाने कोकणात उतरून कल्याण पुन्हा घेतले. नाशिकच्या बाजूस खान जहान शिरला होता. दोन्ही ठिकाणी मराठ्यांनी प्रतिकार केला. पण त्यांचा पराभव झाला. तरीही गोवळकोंड्यापासून चांद्यापर्यंत मराठी फौजा या वेळी सारख्या दौडत होत्या; आणि मोगली फौजांचे अन्नपाणी तोडून, त्यांवर अचानक छापे घालून त्यांना हैराण करीत होत्या.
{{gap}}याच काळात सिद्दीशी मराठे लढत होते. सिद्दीचा जंजिरा घेण्यात त्यांना यश आले नाही व त्याचा पक्का बंदोबस्तही करता आला नाही हे खरे. पण त्याला त्यांनी वचक बसविला होता. पोर्तुगीजांच्या बाबतीत मराठ्यांना यापेक्षा जास्त यश आले. फोंड्याचा वेढा त्यांनी मारून काढला आणि कुंभारजुवे हे घेऊन साष्टीवारदेश त्यांनी मारला. याच वेळी गोव्यावर चालून जाण्याचा संभाजी महाराजांचा संकल्प होता. पण शहा आलमची फौज रामघाटातून येत आहे असे कळल्यामुळे त्यांना तो रद्द करावा लागला.

'''मोगल-नामुष्की'''
{{gap}}शहा आलमशी मराठ्यांनी कसा मुकाबला केला ते पाहिले म्हणजे मराठ्यांचे तेज मुळीच लोपले नव्हते हे ध्यानात येईल. साठ हजार पायदळ, चाळीस हजार स्वार, वीस हजार उंट व दोन हजार हत्ती अशी प्रचंड फौज घेऊन शहाजादा, गोव्याच्या अलीकडे डिचोलीजवळ उतरला (जाने. १६८४). त्या फौजेसाठी धान्यसामग्री घेऊन मोगलांची १२० गलबते गोव्यास आली. पण, संभाजी आपला सूड घेईल असे वाटल्यावरून, पोर्तुगीजांनी ती सामग्री शहा आलमला दिली नाही. तेव्हा चिडून जाऊन गोवा प्रांतात व कुडाळ, बांदा, मालवण या भागात तो नासधूस करू लागला. मार्च महिन्यात शहाबुद्दिनखान शहाजाद्याला मिळण्यासाठी उत्तर कोकणातून येऊ लागला. पण मराठ्यांनी त्या दोघांची गाठ पडू दिली नाही, तेव्हा हताश होऊन बादशहाचा हा लाडका शहाजादा परत फिरला. उन्हाळ्याचे दिवस, अन्नधान्य नाही आणि मराठे लोकांचे छुपे हल्ले. हजारो माणसे व जनावरे तडफडून मेली आणि भयंकर हाल सोसून, पदरात नामुष्की घेऊन, होते नव्हते ते सर्व घालवून, १६८४ च्या मे मध्ये अहमदनगर येथे तो बापापुढे येऊन दाखल झाला.

'''पागोटे काढले'''
{{gap}}चार वर्षांच्या या मोहिमेत बादशहाला महत्त्वाचा असा एकही विजय मिळाला नाही. पहिल्या दोन वर्षांतच बादशहा निराश होऊ लागला. डोक्यावरचे पागोटे त्याने जमिनीवर रागाने आपटले व 'संभाजीचा पाडाव होईपर्यंत मी हे पागोटे पुन्हा घालणार नाही' असे तो म्हणाला, १६८३ च्या पावसाळ्यात तर तो भ्रमिष्ट होण्याची वेळ आली. ही मोहीम शहाजाद्यावर किंवा मोठ्या सरदारावर सोपवून परत दिल्लीला<noinclude></noinclude>
a0bhrjunco9yl91xt1fu9cso7s88bhh
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०३
104
73559
230859
164608
2026-06-07T03:26:02Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230859
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४७५|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>जावे असेही त्याने एकदा ठरविले. पण कोणीच तयार होईना. त्याचा एक पुत्र अकबर मराठ्यांना येऊन मिळाला होता. शहा आलम आणि इतर अनेक सरदारही मराठ्यांस मिळून आहेत असे त्याला वाटू लागले. या संशयाने त्याने दिलेरखानास कडक शिक्षा केली. तेव्हा त्याने विष घेऊन आत्महत्या केली.
{{gap}}चुटकीसारखे मराठ्यांचे स्वराज्य बुडवायची आकांक्षा धरून बादशहा आला होता. त्याची मराठयांनी अशी अवस्था करून टाकली. सरदेसाई म्हणतात, औरंगाबाद, चांदा, बेदर, फलटण, कल्याण, रायगड एवढ्या विस्तृत टापूत संभाजीने जो विलक्षण सामना केला त्याला इतिहासात तोड नाही. तो विलासमग्न असून त्याने राज्यरक्षणाकडे दुर्लक्ष केले या बखरकारांच्या आरोपांचा वस्तुस्थितीशी मेळ बसत नाही.

'''अकबर प्रकरण'''
{{gap}}अकबर-प्रकरणातही संभाजी महाराजांच्यावर असला आरोप करता येणार नाही. अकबर हा औरंगजेबाचा मुलगा. मारवाडच्या वारसाच्या प्रकरणात औरंगजेबाविरुद्ध सर्व रजपूत उठले होते. त्या वेळी अकबर रजपुतांना मिळाला; आणि बापाविरुद्ध बंड करून उठला. त्याने बापाला पदच्युत केल्याचा जाहीरनामा काढला आणि स्वतः सिंहासनारोहण केले. पण औरंगजेबाने कपटाने भेद केला व रजपुतांना त्याच्यापासून फोडले. तेव्हा अकबर दक्षिणेत संभाजी राजांच्या आश्रयास आला (१-६-१६८१). आता ही संधी फार मोठी होती. हिचा बरोबर फायदा घेऊन संभाजी महाराज बादशहावर चालून गेले असते तर फारच फायदा झाला असता. मुख्य म्हणजे मुसलमानांत फूट पडली असती. अनेक सरदार आणि कदाचित अकबराचे भाऊही, बादशहाविरुद्ध उठले असते, अकबराला मिळाले असते आणि रजपुतांनी याच वेळी उठाव केला असता. यामुळे औरंगजेबाला दक्षिणेत उतरणेही कदाचित शक्य झाले नसते. पण छत्रपती संभाजी यांनी हे साहस केले नाही. प्रथम हे औरंगजेबाचे कपटच आहे, असा त्यांना संशय आला. अकबर कोकणात बादशहासारखा राहू लागला व त्याने फौजही उभी केली, त्यामुळे तो संशय बळावला. पुढे तो नाहीसा झाला तेव्हा, वर सांगितल्याप्रमाणे, स्वराज्यावरच आक्रमण आले होते. अशाही स्थितीत संभाजी महाराजांनी रजपुतांना उठविण्याचा प्रयत्न चालविला होता. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही.
{{gap}}मोगली राज्यात दुफळी पाडून बादशहाला नामोहरम करण्याची ही एक फार मोठी संधी आली होती. शिवछत्रपतींनी ती नक्कीच साधली असती. आणि त्या चढाईमुळे भारताचा सर्व इतिहासच कदाचित बदलला असता. संभाजी महाराजांना या संधीचा फायदा घेता आला नाही हे खरे; पण यातून फार तर येवढेच म्हणता येईल की शिवछत्रपतींची दूरदृष्टी, त्यांचे असामान्य साहस, मुत्सद्देगिरी हे गुण संभाजी महाराजांच्या ठायी नव्हते. हे म्हणणे निराळे, आणि सर्वस्वी नाकर्तेपणाचे, विलासीपणाचे आरोप त्यांच्यावर करणे निराळे. नव्या संशोधनाअन्वये ते आरोप टिकत नाहीत.<noinclude></noinclude>
f2rdzqf3bv1nhiovprbjbgmkfy2303j
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०४
104
73560
230860
164609
2026-06-07T03:26:15Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230860
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४७६}}</noinclude>आणि वर वर्णिल्याप्रमाणे त्यांनी आक्रमकांशी जो मुकाबला केला तो पाहता तर, संशोधनाची गरजच नाही, असे वाटते.
{{gap}}मराठयांच्या प्रतिकारामुळे मोगलांची दुर्दशा झाली याचा आणखी निर्णायक पुरावा म्हणजे त्यांच्यावरची मोहीम सोडून औरंगजेब विजापूर गोवळकोंड्याकडे वळला हा होय. तेथेही मराठ्यांनी त्या दोन शहांना साह्य करून वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फारसा उपयोग न होता ती दोन्ही राज्ये बुडाली. ती दोन्ही इस्लामधर्मीय होती. पण ती शियापंथी होती आणि औरंगजेब कडवा सुनी होता. तो शियांचा फार द्वेष करी. या दोन शाह्या बुडविण्याचे ते एक महत्त्वाचे कारण होते.

'''आक्रमक पवित्रा'''
{{gap}}१६८५ साली औरंगजेबाची पहिली मोहीम संपली आणि दोन वर्षांनी ती नव्या जोमाने सुरू झाली. या मधल्या काळात मराठे स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी लहान मोठी, बऱ्हाणपूर, धरणगाव यासारखी, सतरा धनसंपन्न शहरे लुटली. १६८२ च्या ऑक्टोबरमध्ये संभाजी महाराजांनी भडोचवर म्हणजे महाराष्ट्राबाहेरही स्वारी करून विपुल संपत्ती लुटून आणली. विजापूर गोवळकोंड्याच्या पाडावानंतर मोगल कर्नाटकात शिरले. तो प्रांत या दोन शाह्यांच्या सत्तेखाली होता. तो पडल्यावर आता हा मुलूख सहज घेता येईल असे बादशहाला वाटत होते. पण तेथे दरजी राजे व केसो त्रिमल यांनी त्यांना तोंड देऊन तेथले मराठ्यांचे राज्य वाचविले. या कामी त्यांना कासमखानाशी मोठा सामना करावा लागला. तो करून शिवाय अर्काट, कांची, चिंगलपट ही ठाणी स्वारी करून त्यांनी हस्तगत केली. वांदिवॉश येथे तर इतका मोठा संग्राम झाला की मोगलांना सबुरीचे धोरण पत्करावे लागले.

'''फितुरी'''
{{gap}}पण असे सर्व ठीक असूनही आता १६८६ सालानंतर मराठ्यांचा प्रतिकार ढिला पडू लागला आणि याचे मुख्य कारण म्हणजे फितुरी. प्रत्यक्ष युद्धात मराठे हरत नाहीत हे पाहून बादशहाने भेदनीतीचा अवलंब केला. त्याचे तसे प्रयत्न प्रारंभापासूनच चालू होते; आणि शिर्के, जेथे यांना वतने देऊन त्याने त्यांना वशही केले होते. पण पुढे हा प्रकार सर्रास सुरू झाला, तोच नियम झाला. १६८६ च्या अखेरीस साल्हेरचा किल्ला किल्लेदार असूजी याने मोठी मन्सब घेऊन मोगलांच्या स्वाधीन केला. रामसेजचा किल्ला असाच पडला. १६८८ च्या शेवटी हरीशगड, मदनगड, औंढा इ. सहा किल्ले मोगलांनी फितुरीने घेतले. १६८९ च्या प्रारंभी त्रिंबकगडचे किल्लेदार फितुर झाले. त्यांना मन्सब मिळाली. ठाणे जिह्यातील माहुली किल्ला द्वारकोजी या किल्लेदाराने लाच घेऊन मातबरखानाच्या स्वाधीन केला. बजाजी निंबाळकर १६८२ सालीच मोगलांकडे गेला होता. त्याचा मुलगा महादजी याला त्याची मनसब मिळाली.<noinclude></noinclude>
fjqxwt3aowo8nmhnpyp7eu1e04amhbe
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०५
104
73561
230861
164610
2026-06-07T03:27:56Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230861
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४७७|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>त्याने विजापूर गोवळकोंडा पडल्यावर वाडीकर खेम सावंताला लिहिले की बादशहा- इतका थोर कुणी नाही. विजापूर, गोवळकोंड्याप्रमाणेच संभाजीचीही गत होईल. त्याच्या आत तुम्ही बादशहाकडे यावे. शिवाजी महाराजांचा जावई अचलोजी याला १६८६ साली पंचहजारी देऊन मोगलांनी वळविले. याशिवाय निरनिराळ्या कागदपत्रांत आणखी लहानमोठ्या तीसचाळीस फितुरांची नावे सापडतात. ज्यांची नोंद नाही असे आणखी कित्येक असतील.

'''निष्ठा लोपली'''
{{gap}}याचा अर्थ असा की शिवछत्रपतींनी जी राष्ट्रनिष्ठा मराठ्यांच्या ठायी रुजविली होती ती आता लोपत चालली होती. छत्रपतींच्या काळी तिने वरी मुळे धरली होती. पण कोणत्याही निष्ठेला अखंड जलसिंचन हवे असते. शिवछत्रपती, समर्थ रामदास यांसारखे महापुरुषच हे काम करू शकतात. त्या दोघांच्या निर्वाणानंतर महाराष्ट्रात तसा पुरुष, तसा नेता, तस तत्त्ववेत्ता, कोणी झाला नाही. संभाजी महाराज विलासमग्न होते, कलुषाच्या आहारी गेले होते, हे प्रवाद आता खोटे ठरले आहेत. पण लोकांच्या राष्ट्रनिष्ठेला जलसिंचन करण्याचे सामार्थ्य त्याच्या ठायी नव्हते, हे खरेच आहे. ते स्वतःच एकदा मोगलांना मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या वाणीला ती महाप्रेरणा देण्याची शक्ती असणे शक्यच नव्हते. त्यामुळेच ते नवकर्तबगार पिढी निर्माण करू शकले नाहीत. हंबीरराव, हरजी राजे असे काही जुने कर्तेपुरुष होते. त्यांच्या वरच गुजराण होत होती. तानाजी, प्रतापराव गुजर, मोरोपंत, अनाजी यांसारखे तीस चाळीस लोक शिवछत्रपतींच्या भोवती होते. तसा नामांकित एकही पुरुष संभाजी महाराजांना निर्माण करता आला नाही. आणि दुसरा कोणीही राष्ट्रधर्माचा प्रणेता या काळात निर्माण झाला नाही. हे देशाचे दुर्दैव होय.

'''आर्थिक दुर्दशा'''
{{gap}}मराठ्यांची प्रतिकारशक्ती ढिली पडण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक धनाची टंचाई हे होय. १६८१ सालापासून सर्व महाराष्ट्रभर लष्कराचा धुमाकूळ चालू झाला. त्यामुळे शेती आणि व्यापार ही दोन्ही आर्थिक क्षेत्रे उद्ध्वस्त होऊन गेली. शेती करायला कोणाला उत्साहच राहिला नाही आणि त्यातून थोडी शेती पिकली तर मोंगल तिची अखंड लूट करीत असत. संभाजी महाराजांना सर्व आघाड्यांमिळून पंचवीस तीस हजार लष्कर ठेवावेच लागत होते. शिवाय आरमार, दारूगोळा यांचा खर्च होताच. एवढा खर्च हळूहळू भागेनासा झाला. त्यामुळे लष्कराचे पगार थकू लागले. मग ज्या त्या तुकडीने, टोळीने, पथकाने आपापले भागवावे असे झाले. त्यामुळे शिवछत्रपतींच्या वेळची शिस्त संपुष्टात आली. त्यांच्या वेळी लष्करी लुटीतला सुतळीचा तोडाही कोणाला गिळंकृत करता येत<noinclude></noinclude>
kc27s9f9rmc02seydv4tg7toxdcm2yi
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०६
104
73562
230862
164611
2026-06-07T03:28:39Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230862
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४७८}}</noinclude>नसे. आता प्रत्यक्ष आज्ञेने नव्हे, पण अप्रत्यक्षपणे ते घडू लागले. त्यामुळे खजिन्यात पैसा जमा होईनासा झाला आणि पेचप्रसंग वाढू लागले. शेती खालावली, व्यापार मंदावला, लूट जमा होईनाशी झाली. त्यामुळे सर्व अर्थव्यवस्थाच कोसळून पडण्याची वेळ आली. अशा स्थितीत युद्धप्रयत्न ढिले पडले तर त्यात नवल कसले ?

'''नवे चैतन्य'''
{{gap}}फितुरीमुळे, आर्थिक विपन्नतेमुळे आणि शिस्त लोपल्यामुळे मराठ्यांचा प्रतिकार याच वेळी थंडावून औरंगजेबाचे मनोरथ पूर्ण झाले असते. पण संभाजी महाराजांनी मृत्यूसमयी जे अग्निदिव्य केले त्यामुळे गात्रे ढिली पडत चाललेल्या या देहात पुन्हा चैतन्याचा संचार झाला. 'तुझे सर्व किल्ले व खजिना आमच्या ताब्यात दे, आणि जे मोगल अधिकारी तुला फितूर झाले असतील त्यांची नावे सांग,' असे बादशहाने महाराजांना फर्माविले. पण त्यांनी या मागण्या फेटाळून लावल्या आणि अत्यंत उर्मट असा जवाब दिला. 'तू मुसलमान हो', अशी तिसरी अट बादशहाने घातली होती. त्यावर, 'तुझी बेटी आम्हाला देशील तर आम्ही मुसलमान होऊ,' असा अत्यंत जहाल व मानहानिकारक जबाब छत्रपतींनी दिला. (अलीकडे हे सर्व निराधार आहे, असे संशोधक म्हणतात) यामुळे बादशाचा तोल सुटला आणि त्याने अत्यंत क्रूरपणे महाराजांचा वध केला.
{{gap}}या वेळी संभाजी महाराजांनी कच खाल्ली असती, माफी मागून दयेची भीक मागितली असती, लाचारी दाखविली असती तर मराठे बहुधा येथेच संपले असते. पण तसे घडले नाही. शिवछत्रपतींचे तेज या शेवटच्या क्षणी त्यांच्या पुत्राने दाखविले धीरोदात्तपणे त्यांनी मृत्यू पत्करला. आणि जिवंतपणी जे राष्ट्रतेज ते निर्मू शकले नाहीत ते मृत्यूच्या दिव्यक्षणी त्यांनी मराठयांना दिले. सर्व महाराष्ट्र पुन्हा चैतन्याने रसरसू लागला. रामचंद्रपंत आमात्य, शंकराजी नारायण, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, परशुराम त्रिंबक आणि खंडोजी बल्लाळ असे सहा थोर कार्यकर्ते, नेते उदयास आले. हे सर्व शिवछत्रपतींच्या सहवासातच वाढले होते. तेव्हा त्यांच्या प्रेरणेचा स्फुल्लिंग तोच होता. पण मधल्या अवधीत तो विकसित होत नव्हता, मलिन झाला होता. संभाजीमहाराजांच्या त्या असीम धर्मनिष्ठेमुळे तो पुन्हा उजळला आणि त्याने स्वातंत्र्ययुद्धात विजय मिळविण्याची महनीय कामगिरी केली.

'''भ्रमनिरास'''
{{gap}}शिवछत्रपतींच्या निधनानंतर मराठ्यांचे स्वराज्य सहज वुडविता येईल असे बादशहास वाटत होते. पण त्या वेळी त्याचा भ्रमनिरास झाला. तसाच भ्रमनिरास शंभुछत्रपतींच्या निधनानंतर पुन्हा एकदा झाला. या वेळीही आता हे राज्य बुडाले, आपले स्वप्न साकार झाले, असे त्यास वाटू लागले. पण संभाजीमहाराजांचा त्याने<noinclude></noinclude>
046k4nay3flowtf2z6j2avha94casx5
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०७
104
73563
230863
164612
2026-06-07T03:29:21Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230863
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४७९|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>वध केला त्याच साली व त्याच ठिकाणी त्याच्या छावणीवर संताजी घोरपडे यांनी छापा घालून बादशहाच्या डेऱ्याचे सोन्याचे कळस कापून नेले! आणि त्याचे स्वप्न भंगून टाकले. त्याचा भ्रम नष्ट केला.
{{gap}}उत्तरोत्तर मराठयांचे हे आक्रमक तेज वाढतच गेले आणि ते राज्याला तसा कर्तबगार, समर्थ नेता नसताना, हे विशेष.

'''राजाराम'''
{{gap}}शंभुछत्रपतींच्या नंतर राजाराम महाराज गादीवर आले. त्यांच्या अंगी तेज, कर्तृत्व काहीच नव्हते. पहिली दहा वर्षे रायगडावरच त्यांचे बालपण गेले. १६८० सालापासून १६८९ पर्यंत संभाजी महाराजांनी त्यांना नजरकैदेतच ठेवले होते. गादीवर आल्यावर लगेच ते जिंजीला गेले आणि तेथे १६९८ पर्यंत अडकून पडले होते. अशी वयाची २८ वर्षे गेली. १७०० साली त्यांना मृत्यू आला. कारकीर्द संपली.
{{gap}}पण असे असले तरी राजाराम मनाने मोठे होते आणि त्या मोठेपणाचा स्वराज्याला मोठा उपयोग झाला. राज्याचा खरा वारस शाहू आहे; तो कैदेत आहे म्हणून आम्ही त्याचे राज्य चालवितो, अशी भूमिका प्रथमपासूनच त्यांनी घेतली होती. यामुळेच जिंजीला जाणे, तेथे राहणे व आठ वर्षांनी परत येणे या प्रसंगी त्यांना स्वामिनिष्ठ व कर्तबगार माणसे मिळाली.

'''नैतिक उंची'''
{{gap}}राजधानी रायगडला मार्च १६८९ मध्ये वेढा पडला. त्या वेळी संभाजी महाराजांची राणी येसूबाई हिने सांगितले की राजारामांनी आता येथून बाहेर पडावे आणि पुढे योग्य वेळी आम्हांस सोडवून न्यावे. येसूबाईच्या या निःस्वार्थी, उदार विचारांमुळे सर्वांना धीर आला. तिने शाहूच राज्याचा मालक, हा आग्रह धरला नाही. यामुळे लोकांना ध्येयवादाची मोठी प्रेरणा मिळाली आणि रायगड ते जिंजी हा राजारामांचा प्रवास सुरक्षित पार पडला. गावोगावच्या ठाणेदारांना बादशहाने सक्त हुकूम पाठविले होते की राजारामाला पकडावे. पण त्यांना ते शक्य झाले नाही. एक सरदार किंवा हुजऱ्या जरी त्या वेळी फितूर झाला असता तरी धडगत नव्हती. पण तसे घडले नाही. सेनापती पानसंबळ, प्रल्हाद निराजी, निळो व बहिरो मोरेश्वर पिंगळे, खंडो बल्लाळ, मानसिंग मोरे, रुपाजी भोसले, बाजी व खंडोजी कदम, बहिरजी व मालोजी घोरपडे या सर्व मंडळींनी जिवास जीव देऊन, संघटित राहून, छत्रपतींना संभाळून नेले. मराठ्यांच्या नैतिक उंचीच्या दृष्टीने ही गोष्ट इतिहासात नोंद करून ठेवण्याजोगी आहे. ८-९ वर्षांनी राजाराम महाराज परत आले, त्या वेळीही त्याग, ध्येयनिष्ठा, स्वामिनिष्ठा या गुणांचा असाच प्रत्यय आला. औरंगजेबाविरुद्ध मराठ्यांनी ही एक मोठी लढाईच जिंकली, असे म्हणावे लागते.
<noinclude></noinclude>
9id03dr7i8b0se5vr5scblxavfr6jk6
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०८
104
73564
230864
164686
2026-06-07T03:30:16Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230864
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४८०}}</noinclude>
'''शून्याकार'''
{{gap}}इ. १६८९ हे साल मराठ्यांच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवाचे आणि बाह्यतः तरी सर्वनाशाचे ठरले. मार्चमध्ये संभाजीमहाराजांचा वध झाला. सप्टेंबरमध्ये राजाराम महाराज जिंजीकडे निघून गेले आणि नोव्हेंबरमध्ये राजधानी असलेला किल्ला पडला. किल्ला पडला तेव्हा येसूबाई आणि शाहू बादशहाच्या कैदेत गेले. मागे खानाने रायगड सर्व लुटून फस्त केला आणि शिवछत्रपतींचे सिंहासन फोडून टाकले. म्हणजे या एका वर्षात मराठ्यांच्या स्वराज्याचा शून्याकार झाला.
{{gap}}पण अशाही स्थितीत शिवछत्रपतींच्या पुण्यस्मरणाने व संभाजी महाराजांच्या प्रेरणेने या शून्यातून पुन्हा चैतन्य निर्माण झाले. आणि औरंगजेबाला गिळून स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास ते समर्थ ठरले.

'''षण्मुखी नेतृत्व'''
{{gap}}यावेळी महाराष्ट्राला राजा नव्हता किंवा सर्वाधिकारी असा एकही नेता नव्हता. पण रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, परशुराम त्रिंबक आणि खंडो बल्लाळ असे षण्मुखी नेतृत्व मराठ्यांना लाभले आणि या थोर कर्त्या पुरुषांनी स्वातंत्र्ययुद्ध पहिल्यापेक्षा अधिक जोमाने चालवून, मऱ्हाष्ट्र राज्य जिवंत ठेवले.
{{gap}}आपण प्रथम प्रत्यक्ष स्वातंत्र्यसंग्रामाचे, युद्धाचे रूप पाहात आहो. संस्कृतीच्या इतर अंगांचे विवेचन त्यानंतर करावयाचे आहे. युद्धाच्या दृष्टीने पाहता १६८९ च्या पुढच्या काळात विशेष कोणाचा पराक्रम उठून दिसत असेल तर तो संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांचा आणि त्याच्या खालोखाल शंकराजी नारायण व परशुराम त्रिंबक याचा.

'''शंकराजी नारायण'''
{{gap}}शंकराजी नारायण हा मावळ प्रांताचा विशेष माहीतगार होता आणि मावळे लोकांवर त्याची छापही चांगली होती. संभाजी महाराजांना पकडल्यावर औरंगजेबाने मावळातील किल्ले भराभर जिंकले. पण तशाच तडफेने शंकराजी नारायण याने मोगलांचा उच्छेद करून ते परत घेतले आणि पुढे वाईपर्यंत स्वारी करून वाईचा कोट व प्रतापगड हे किल्ले त्याने रगडून घेतले. शंकराजी नारायण हा अत्यंत कजाखी व धाडशी होता. म्हणूनच या पडत्या काळात तो बहुमोल कामगिरी करू शकला.

'''परशुराम त्रिंबक'''
{{gap}}जसा शंकराजी नारायण तसाच परशुराम त्रिंबक. हा प्रथम कारकुनीत होता. पण लवकरच तो युद्धप्रसंग करू लागला आणि सुभालष्कर, समशेरजंग हे किताब त्याने<noinclude></noinclude>
99ithgdu5a9dgo32932ib1x8qdpl9jg
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०९
104
73575
230865
164687
2026-06-07T03:30:34Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230865
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४८१|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>मिळविले. मावळ - सातारा, वाई या भागात जे शंकराजी नारायणाने केले तेच परशुराम त्रिंबक याने मिरज-रांगणा या प्रदेशात केले. त्याची मुख्य कर्तबगारी दिसून आली ती औरंगजेबाने जिंकलेला पन्हाळा किल्ला परत घेण्यात. दोन वर्षे त्यासाठी त्याला लढावे लागले. पण अखेर त्याने तो गड जिंकला आणि बादशहाने जंग जंग पछाडले तरी पाच वर्षांपर्यंत तो जाऊ दिला नाही.
{{gap}}पण मोगलांना नामोहरम करण्याचे मोठे श्रेय कोणास द्यावयाचे तर ते संताजी व धनाजी यांना. आणि विशेषतः संताजी घोरपडे यांना. मोगलांचे सामर्थ्य पार खच्ची करून टाकण्याची महनीय कामगिरी त्यांनीच केली.

'''संताजी घोरपडे'''
{{gap}}पहिल्या सलामीलाच संताजी घोरपडे यांनी बादशहाच्या डेऱ्याचे कळस कापून त्याचा मुखभंग केला हे वर सांगितलेच आहे. १६९० साली बादशहाने सर्जाखान यास सातारा किल्ला घेण्यास पाठविले. पण संताजी व धनाजी यांनी त्यास हत्तीवरून ओढून कैद केले आणि एक लाख दंड घेऊन मग सोडून दिले. यानंतर बादशहाने फिरून जंगास पाठविले व त्याच्या मदतीस अब्दुल कादीर यास दिले. पण रुपाजी भोसले याने कादीरचे सर्व लष्कर लुटून फस्त केले. त्या नंतर लुत्फुल्लाखान सातारा घेण्यासाठी आला. पण म्हसवडजवळ संताजी, धनाजी, डफळे, मोरे यांनी त्याचा पराभव करून त्यास हाकलून लावले. बादशहाने विजापूर प्रांत जिंकला होता. त्यावर वारंवार झडप घालून संताजी तो प्रांत लुटून फस्त करीत असे. १६९२ साली संताजी व धनाजी यांनी बेळगाव-धारवाडवर हल्ले चढविले. बादशहाचे तीन सरदार वेदरबखखान, लुत्फुल्लाखान आणि हमीदुद्दीनखान बचावासाठी धावून आले. कासीमखानही शिऱ्याहून त्यांच्या मदतीला आला. पण ती शहरे लुटून मराठे केव्हाच पसार झाले होते.

'''आग्या मोहोळ'''
{{gap}}या मोठ्या लढायांच्या वार्ता झाल्या. पण मोठ्या मराठा सरदारांनी मोगलांचा ठायी ठायी असा नक्षा उतरवलेला पाहताच सर्वच शिपाईगड्यांना अंगात वारे संचारल्यासारखे झाले आणि आग्या मोहोळ उठावे तसा प्रकार झाला. गुजराथ, बागलाण, गोंडवन येथपासून कर्नाटक, जिंजीपर्यंत मराठी फौजा वाऱ्यासारख्या फिरू लागल्या. हे मराठे छापे घालीत, खंडण्या घेत, बादशहाची ठाणी उठवीत, सामान, सुमान, हत्ती घोडे, उंट लुटून घेत. अकस्मात यावे, बकाने मत्स्य उचलून न्यावा तसा घाला घालावा, खाण्यापिण्याची दरकार बाळगू नये, थंडी, वारा, ऊन, पाऊस काही पाहू नये, चटणी, भाकरी घोड्यावरच खावी आणि वाऱ्यासारखे नाहीसे व्हावे, असा त्यांचा खाक्या होता. हे मराठे किती आहेत, कोठून येतात, याचा मोंगलांना काही अदमासच लागेना. बादशहा अगदी रडकुंडीला आला. तो म्हणे, 'मराठे आदमी नव्हत, हा भूतखाना आहे.'
<noinclude>
{{gap}}३१</noinclude>
3idwp88x27t8kh1h2t1eyvyve4bx7wu
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१०
104
73576
230866
164688
2026-06-07T03:30:56Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230866
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४८२}}</noinclude>

'''दिल्लीकडे'''
{{gap}}मोगल असे निस्तेज, हताश झालेले पाहून मराठ्यांना भलतीच उमेद चढली. औरंगजेबाचे सर्व राज्य उलथून टाकून दिल्ली काबीज करण्याची सुखस्वप्न ते पाहू लागले. १६९१ साली हणमंतराव घोरपडे यास लिहिलेल्या पत्रात राजाराम महाराजांनी काय सांगितले आहे पाहा. 'तुमचा संकल्प जाणून स्वामींनी फौज खर्चास सहा लक्ष होनांची नेमणूक करून दिली आहे. रायगड, विजापूर, भागानगर व औरंगाबाद हे चार प्रांत काबीज केल्यावर तीन लाख आणि प्रत्यक्ष दिल्ली काबीज केल्यावर बाकीचे तीन लाख, असा निश्चय केला आहे. महाराष्ट्रधर्म चालवावा. एकनिष्ठपणे सेवा करावी.'
{{gap}}जिंजीस वेढ्यात अडकून पडलेला मराठ्यांचा छत्रपती हे पत्र लिहितो, हे हास्यास्पद आहे, असे क्षणभर वाटेल. पण सरदेसायांनी वारंवार लिहिले आहे की मराठ्यांची एकजूट व निष्ठा कायम असती तर यात अवघड असे काही नव्हते.

'''मोगल भारी नव्हते'''
{{gap}}या पंचवीस वर्षांतील मोगली लष्कराची स्थिती, त्यांच्या सरदारांची वृत्ती आणि औरंगजेबाचा हट्टाग्रही स्वभाव यांची वर्णने वाचताना मनात येते की खरोखरच यात अववड काही नव्हते. औरंगजेबाचा एक मुलगा अकबर तर उघडपणे मराठ्यांना मिळाला होता. शहा अलमबद्दल बादशहाला तशीच शंका होती. किंबहुना बादशहाला सर्व सरदार पुत्र व नातू यांच्याबद्दल तसा संशय होता. सरदारांना कसलाच उत्साह नव्हता. कारण केल्या पराक्रमाचे बादशहा स्मरण ठेवीलच, अशी कोणालाच खात्री नव्हती. दिलेरखानने यामुळेच आत्महत्या केली. आणि शहा आलमचा मुलगा तर बादशहालाच ठार मारायला निघाला होता. शिवाय घरापासून माणसे किती दिवस दूर राहावी याला काही मर्यादाच राहिली नव्हती. दिल्ली प्रांत सोडून सतत दहा, पंधरा, वीस वर्षे, पंचवीस वर्षे मोहीमशीर राहावयाचे म्हणजे काय चेष्टा आहे ! त्यात अन्न, वस्त्र, घर यांची नित्य वानवा. आणि यावर मराठ्यांच्या भुतावळीशी गाठ. अवर्षण, अतिवर्षण, दुष्काळ, प्लेग, कॉलरा या आपत्तीही दर दोन-तीन वर्षांनी येतच होत्या. त्यामुळे नेटाने लढण्यास उत्साह कोणालाच नव्हता. तेव्हा शिवछत्रपतींच्या वेळच्या निष्ठा, जूट व ध्येयवाद टिकला असता तर मोगल हे मराठ्यांना भारी नव्हते हे सहज पटू लागते.
{{gap}}त्या निष्ठा, तो ध्येयवाद यांचे काय झाले याचा विचार वर थोडासा केला आहे. पुढे आणखी करावयाचा आहे. सध्या या स्वातंत्र्यसंग्रामाचे स्वरूप आपण पाहात आहो.

'''जिंजी - कर्नाटक'''
{{gap}}महाराष्ट्रात संग्राम कसा चालू होता हे वर आपण पाहिले. याच वेळी दक्षिणेस<noinclude></noinclude>
e9oodnv9ijda9axnb9mfym9ng45870q
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५११
104
73577
230867
164689
2026-06-07T03:31:08Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230867
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४८३|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>कर्नाटकात जिंजीपर्यंत युद्धक्षेत्र पसरले होते. १६९० च्या ऑगस्टमध्ये झुल्लिकार खानाने जिंजीस वेढा घातला आणि १६९८ च्या फेब्रूवारीत किल्ला पडला. पण ही आठ वर्षे सतत वेढा चालू होता असे नाही. जिंजीला महाराष्ट्रातून जाणारी धान्य- सामग्री, दारूगोळा आणि लष्कर यांना मराठी फौजा इतके हैराण करीत की खानाला दोनतीनदा वेढा उठवून दूर निघून जावे लागले होते. जिंजीच्या वेढ्यावरही संताजी धनाजी सारखे तुटून पडत आणि अनन्वित संहार व विध्वंस करीत. शिवाय मोगलांची अशी नामुष्की झालेली दिसताच कर्नाटकातील समस्त हिंदुसत्ताधीश मराठ्यांच्या पक्षाचे झाले. याचप्पा नाईक हा तिकडचा शूर सरदारही मराठ्यांना मिळाला आणि हे सर्व लोक अन्नधान्याची वाहतूक व लष्कराच्या हालचाली या बाबतीत मोगलांची कोंडी करू लागले. यामुळे झुल्पिकारखान एकदा इतका हताश झाला की राजाराम महाराजांच्याकडे माणूस पाठवून त्याने असे सुचविले की 'तुम्ही मागाल तो दंड देतो. पण जिंजीवरून आम्हास सुरक्षित बाहेर जाऊ द्या.' प्रत्यक्षात त्याने तसे कधी केले नसते, बादशहाने त्यास तसे करू दिले नसते, हे खरे. पण वेळ आली होती. यावरून मराठ्यांनी मोगली सेनेची किती दुर्दशा केली होती ते दिसून येते.

'''दुडेरीचा संग्राम'''
{{gap}}१६९५ च्या अखेरीस संताजी व धनाजी तुंगभद्रा उतरून जिंजीकडे निघाले असता बादशहाने कासिमखानास त्यांच्यावर पाठविले. आणि मागोमाग खानाजादखान या बड्या सरदारास त्याच्या मदतीस पाठविले. या बड्या सरदाराचा मोठा पाहुणचार करावा असे कासिमखानास वाटले. आणि अडोणी, चित्रदुर्ग या परिसरात मोठा भपकेबाज शामियाना त्याने उभारला. संताजीला याची खडानखडा बातमी होती. त्याने आपल्या लष्कराच्या तीन टोळ्या करून गनिमी काव्याने त्या ठाण्यावर सर्व बाजूंनी हल्ले चढविले. अन्नधान्याची नासाडी केली व सर्व गोट साफ लुटला. दोन्ही खानांना दे माय धरणी ठाय केले. शेजारीच दुडेरीची गढी होती. तिचा आश्रय त्यांनी केला. पण संताजीने गढीला वेढा घातला. तेव्हा अन्नपाण्यावाचून लष्कर तडफडू लागले. खानजादखानाने संताजीकडे तहाचे बोलणे लावले. वीस लाख दंड व सर्व सामग्री घेऊन खानाला अंगावरच्या वस्त्रानिशी सोडून दिले. कासिमखानाच्या मदतीस दुसरा एक सरदार हिंमतखान बहादूर येत होता. संताजीने बसवपट्टण येथे त्यास गाठून मैदानात त्यास ठार मारले व त्याचे सामान लुटून घेतले.
{{gap}}कर्नाटकातील मराठ्यांचे हे पराक्रम पाहता वरील निष्कर्षच दृढ होतो की मोगल मराठ्यांना भारी नव्हते. पण फितुरी आणि दुही या व्याधीमुळे मराठ्यांचे बळ सारखे खच्ची होत होते. दुहीचे सर्वात भयंकर उदाहरण म्हणजे संताजी आणि धनाजी यांचे वैमनस्य आणि ते इतके की त्यांच्यात आयेवार कुटी येथे १६९६ साली प्रत्यक्ष लढाईच झाली आणि त्यातूनच पुढे दुही-फितुरीमुळे संताजीचा खून झाला. त्यानंतर ही<noinclude></noinclude>
6j18bia0k4tavger9jcofdswar2v6q9
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१२
104
73578
230868
164690
2026-06-07T03:31:26Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230868
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४८४}}</noinclude>लढाया होत राहिल्या. या सर्वांची चिकित्सा पुढे करावयाची आहे. प्रथम १७०७ पर्यंत मोगलांचा प्रतिकार मराठ्यांनी कसा केला हे पाहू.

'''राजाराम - पुण्याई'''
{{gap}}१६९७ च्या अखेरीस राजाराम महाराज जिंजीच्या वेढ्यातून सुटून विशाळगडावर परत आले. या वेळी झुल्पिकारखानाने स्वतःच राजारामांच्या सुटकेची व्यवस्था केली होती. त्यांनी कोठून कसे सुटून जावे, हे त्यानेच महाराजांना कळविले होते. शिवाय मोगलांच्या बाजूने वेढ्याचे काम करणारे सरदार शिर्के याना खंडोजी बल्लाळ यांनी आपल्याकडे आलेले त्यांचे वतन त्यांना परत देऊन, वश करून घेतले. त्यामुळे सुटका सुलभ झाली. पण राजाराम महाराज पुढे फार दिवस जगले नाहीत. विशाळगडावरून नर्मदापार मोठी मोहीम काढावयाची, असे ठरवून ते बाहेर पडले, पण मोहिमेला प्रारंभिक यशही आले नाही. आणि नेटाने, तडफेने काही करण्याची कुवत राजारामांच्या ठायी नव्हती. त्यातच त्यांची प्रकृती बिघडली आणि इ. स. १७०० च्या मार्चमध्ये सिंहगडावर त्यांचा अंत झाला. आणि स्वराज्याला दुसरा धक्का बसला. राजारामांच्या ठायी कर्तृत्व नव्हते; पण त्या काळी राजा ही पुण्याई होती. स्वामी कसाही असला तरी स्वामिनिष्ठेने लोक बांधले जात व आपल्याला धनी आहे ही भावना प्रजेच्या मनात असे. तो दिलासा आता गेला, आणि लोक उघडे पडले.

'''ताराबाई'''
{{gap}}पण याहीपेक्षा मोठी हानी झाली ती म्हणजे मराठी राज्य आता दुभंगले. राज्याचा खरा मालक शाहू कैदेत होता. तो सुटेल तेव्हा तोच गादीवर यावयाचा, असा संकेत सर्वांच्या मनात होता. पण राजारामाची राणी ताराबाई हिचा आग्रह असा की आपला मुलगा शिवाजी हाच खरा राज्याचा धनी. तेव्हा त्याला अभिषेक झाला पाहिजे. रामचंद्रपंत अमात्य याचा याला विरोध होता. युद्ध संपेपर्यंत हा वाद काढू नये, दुही बाहेर दिसू नये, असे त्याला वाटे. पण शंकराजी नारायण, परशुराम त्रिंबक यांना ताराबाईने वळवून घेतले होते. तेव्हा पंतानी माघार घेतली व अभिषेकास संमती दिली. पण या वेळेपासून त्यांचे मन विटून गेले आणि त्यांचा आवेश संपुष्टात आला.

'''पुन्हा निराशा'''
{{gap}}संभाजी महाराज गेले, तेव्हा आता मराठ्यांचे राज्य आपण सहज बुडवू, असे बादशहाला वाटू लागले. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्याला पुन्हा तशीच आशा वाटू लागली. पण याही वेळेस त्याला निराशेचा जबर तडाखा बसला. मराठ्यांचा जोम, आवेश, प्रतिकारशक्ती, पराक्रम कमी न होता वाढतच आहे, असे त्यास दिसू लागले. राजाराम गेल्यावर ताराबाईने कारभार हाती घेतला आणि स्वातंत्र्याचा<noinclude></noinclude>
oetusc57cdvgenuayeu26koa9bn0bye
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१३
104
73579
230869
164691
2026-06-07T03:31:38Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230869
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४८५|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>लढा पूर्वीच्याच आदेशाने, पुढे चालविला. १७०० ते १७०७ या सात वर्षातील राज्यरक्षणाचे श्रेय इतिहासकार ताराबाईला देतात. काफीखानासारख्या मुस्लिम लोकांनीसुद्धा तिचा गौरव केला आहे आणि तिने केलेल्या कार्यावरून तो खरा आहे असे दिसते.

'''लांडगेतोड'''
{{gap}}या सात वर्षातल्या युद्धाची कथा मागल्या काळापेक्षाही जास्त रसरशीत आहे. औरंगजेबाचा आपल्या सरदरांवर विश्वास राहिला नव्हता. त्यामुळे तो स्वतः मोहीमशीर झाला आणि मराठ्यांचे किल्ले घेण्याचा त्याने सपाटा लावला. इ. स. १७०० च्या एप्रिलपासून इ. स. १७०५ एप्रिलपर्यंत त्याने सातारा, परळी, पन्हाळा, सिंहगड, खेळणा इत्यादी मराठ्यांचे दहा किल्ले घेतले. पण हे किल्ले त्याने कसे घेतले, त्यांचे पुढे काय झाले आणि या अवधीत मराठ्यांनी मोगल फौजेची कशी लांडगेतोड केली, हे पाहिले म्हणजे मोगल साम्राज्य व त्याचा सत्ताधीश औरंगजेब यांची मृत्युपंथाकडे ही वाटचाल सुरू झाली होती, हे स्पष्ट दिसू लागते.
{{gap}}या दहा किल्ल्यांपैकी मोगलांनी लुटून जिंकून घेतला असा फक्त तोरणा किल्ला होय. बाकीच्या सर्व किल्लेदारांना पैसे देऊन ताब्यात घेतलेले होते. पण या वेळी मराठयांनी पैसे घेऊन किल्ले दिले. याला फितुरी असेही पण म्हणता येत नाही. कारण किल्ले घेतल्यानंतर, त्यांची व्यवस्था ठेवण्याची कुवत बादशहाला नाही, हे मराठयांनी चांगले ओळखले होते. त्यामुळे, पाचसहा महिने किल्ला लढविल्यानंतर, दमछाक झाल्यावर, ते किल्ला ताब्यात देत आणि वेढा उठवून बादशहा निघून गेला की लगेच किल्ला जिंकून घेत. या रीतीने हे सर्व किल्ले मराठ्यांनी थोड्याच अवधीत परत घेतलेले आहेत. यामुळे मोगलांचे अपरिमित नुकसान होत होते आणि बादशहाची छीथू होत होती.
{{gap}}पण याहीपेक्षा मोगलांची भयंकर हानी होत होती ती किल्ल्याच्या परिसरातील दहावीस मैलांच्या टापूत मराठे लांडगेतोड करीत त्यामुळे. धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, राणोजी घोरपडे, असे सरदार मोगली फौजेवर सारखे फिरते हल्ले चढवीत. त्यांचा दाणागोटा, शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटीत, सर्व प्रकारे विध्वंस करून शेकडो सैनिकांना ठार मारीत आणि सरदारांना लाख, दोन लाख दंड करून सोडून देत. ओला-सुका दुष्काळ, वारेवादळ, पूर यांमुळे आणि रोगांच्या साथीमुळे लष्कराचे हाल होत ते निराळेच. इटालियन प्रवासी मनूचीने लिहून ठेविले आहे की औरंगजेबाच्या लष्करात दरसाल एक लाख माणसे व हत्ती, घोडे, उंट, बैल अशी तीन लाख जनावरे मृत्युमुखी पडत. मोठमोठे सरदार भिकारी झाले. त्यांच्या बायका दारोदार भीक मागत हिंडू लागल्या !
<noinclude></noinclude>
4n7ozdocpwjd9lzc4xnrtpmsr7g69sb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१४
104
73580
230870
164692
2026-06-07T03:31:50Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230870
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||४८६}}</noinclude>
'''उत्तरेवर आक्रमण'''
{{gap}}या काळात मराठे महाराष्ट्रातच फक्त मोगलाशी लढा करीत होते असे नाही. नेमाजी शिंदे, केसोपंत पिंगळे आणि परसोजी भोसले हे ५० हजार स्वार घेऊन नर्मदा उतरोन काळबाग पावेतो लुटीत गेले. १७०५ साली धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, दादो मल्हार, रंभाजी निंबाळकर चाळीस हजार स्वारांनिशी घोडदौड करीत सुरतेवर गेले आणि तेथून भडोचपर्यंतचा सर्व मुलूख त्यांनी फस्त केला. त्यांजवर नजर अलीखान व ख्वाजा हमीद हे चालून गेले; पण त्यांचा मराठ्यांनी फन्ना उडविला, त्या दोघांना कैद केले व त्यांच्यापासून आठ लाख रुपये दंड घेऊन त्यांना सोडून दिले. त्याच साली मराठे माळव्यातही उतरले. बऱ्हाणपूर, वऱ्हाड, खानदेश येथे त्यांच्या स्वाऱ्या नित्याच्याच होत्या. पण आता मराठ्यांनी या परगण्यात कायमचा अंमल बसविण्यास सुरुवात केली. जिंकलेल्या प्रदेशात सुभेदार, कमाविसदार असे अधिकारी नेमू लागले आणि चौथाई, दस्तुरी वसूल करू लागले. याच वेळी बुंदेलखंडात छत्रसालाने उठावणी केली होती. १७७३ साली नेमाजी शिंदे प्रथम माळव्यात व नंतर बुंदेलखंडातही शिरला होता. पण बुंदेलखंडात छत्रसाल सर्व बुंदेलांना उठवू शकला नाही. नाहीतर तेथेही माेंगली सत्ता राहिली नसती.
{{gap}}उत्तरेवर या चढाया चालू असताना मराठे तिकडून बादशहाकडे येणारे लमाणांचे तांडे लुटून फस्त करीत आणि खजिना घेऊन येणाऱ्या शिबंदीचाही नायनाट करीत. त्यामुळे बादशहा पूर्ण नागविला गेला. अन्नधान्य नाही, युद्धसामग्री नाही, पैसा नाही, अशी त्याची स्थिती झाली.

'''बादशहाचा मृत्यू'''
{{gap}}अशा स्थितीत बादशहा अहमदनगरास आला व त्याची प्रकृती जास्तच खालावली. घोर निराशेने त्यास ग्रासले होते. आपण कशाला या मराठ्यांच्या युद्धाच्या फंदात पडलो असे त्यास झाले. त्याचे पुत्र व सरदार त्याच्या मरणाची वाट पहात होते. तो मरतो केव्हा व आपण राज्य घेतो केव्हा, याचीच सर्वांना विवंचना लागली होती. आजमशहा व कामबक्ष हे दोन शहाजादे त्याच्याजवळ होते. पण एक दुसऱ्याला मारील अशी बादशहाला भीती वाटत होती. अशा रीतीने वैफल्य, निराशा, भीती यांनी तो अगदी खचून गेला आणि २० फेब्रुवारी १७०७ रोजी त्याच स्थितीत त्याचा अंत झाला.
{{gap}}बादशहाचा अंत्यविधी उरकल्यावर अहंमदनगर येथे पुत्र आजमशहा तखतनशीन झाला. पण अफगाणिस्तानातून मोठा मुलगा शहा आलम दिल्लीवर चालून येत आहे अशी वार्ता आली. तेव्हा आजमशहाही उत्तरेकडे निघाला. तेवढ्यात बातमी आली की ताराबाईने बहुतेक सर्व किल्ले घेतले आणि धनाजीने पुणे व चाकण ही मारली. तेव्हा सर्व सरदारांचा विचार घेऊन आजमशहाने शाहूराजांना, मराठ्यांच्यात दुही<noinclude></noinclude>
9a9s47zebcgy6ukpxhiufgrytjj6dme
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५१५
104
73581
230871
164693
2026-06-07T03:32:01Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230871
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|४८७|| स्वातंत्र्ययुद्ध}}</noinclude>माजविण्याचा हेतू मनात धरून, मुक्त केले आणि अशा रीतीने हे स्वातंत्र्ययुद्ध संपले.
{{gap}}या स्वातंत्र्ययुद्धाची मीमांसा पुढील प्रकरणात करावयाची आहे. या युद्धाचे फलित काय ते प्रारंभीच सांगितले आहे. हे युद्ध मराठ्यांनी जिंकले आणि शिवछत्रपतींनी स्थापिलेले स्वराज्य त्यांनी टिकवून धरले. दुसरे मोठे फल म्हणजे मोगल बादशहा आणि मोगल साम्राज्य यांचा कणाच या युद्धात मराठ्यांनी मोडून टाकला. पुन्हा भारतात पूर्वीसारखी मुस्लिम सत्ता कधीच प्रस्थापित झाली नाही. युद्धाच्या या फलिताविषयी वाद नाही. पण याही पलीकडे जाऊन आणखी चिकित्सा करणे अवश्य आहे. शिवछत्रपतींनी दिलेल्या नव्या प्रेरणा, नवा ध्येयवाद, नवी मूल्ये ही मराठ्यांनी टिकवून धरली काय, त्यांनी शिकविलेल्या राष्ट्रधर्माचे काय झाले, त्यांच्या आर्थिक तत्त्वांचे काय झाले, हे आपल्याला पाहिले पाहिजे. कारण या युद्धात जे घडले त्याचे परिणाम पुढे मराठी साम्राज्यावर, आणि त्यामुळेच अखिल भारतावर झालेले आहेत. म्हणून महाराष्ट्र संस्कृतीच्या दृष्टीने त्याचे विवेचन केले पाहिजे. पुढील प्रकरणात ते करू.

{{center|■}}<noinclude></noinclude>
mcnaj42s6ks5r1i4u6fg70nlymltow0
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१११
104
85875
230872
230831
2026-06-07T11:45:38Z
JayashreeVI
4058
230872
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१०६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}या प्रश्नावर प्रकाश पाडणारा व या प्रश्नाचें निश्चित उत्तर देणारा पुरावा महाराष्ट्र इतिहासाचा व महाराष्ट्रीय जुन्या वाङ्मयाचा मोठ्या आस्थेनें व कळकळीनें शोध करणारे व त्याचा काळजीपूर्वक अभ्यास
करणारे धुळ्यांचे ÷रा. चांदोरकर यांना सांपडल्यावर त्यांनीं तो अंशतः केसरींत प्रसिद्ध केला आहे. या पुराव्याचा निर्विकार व शांत मनानें विचार केला असतां रामदासांच्या व शिवाजीच्या भेटीच्या कालाचा वाद शिल्लक रहातच नाहीं. पण रामदास व शिवाजी यांचा संबंध कशा प्रकारचा होता याबद्दल आधच एक ठाम मत बनविल्यामुळे रा. देव व रा. राजवाडे यांनी हा वाद चालू ठेवला आहे किंवा आपल्या पहिल्या प्रश्नावरील मताला अनुरूप असा पुरावा पुढें सांपडेल अशा भरंवशावर ते सांप्रदायिक कालालाच चिकटून राहिले आहेत.

{{gap}}रा. चांदोरकरांना या कागदपत्रांचा शोध कसा लागला ही हकीकत मनोरंजक असल्यामुळे ती येथे देणें अप्रस्तुत होणार नाहीं.

{{gap}}रा. चांदोरकरांच्या मालेगांवच्या एका एंजिनीयर मित्राची त्यांना एकाएकीं मालेगांवास ताबडतोब निघून या ह्मणून तार आली. त्याप्रमाणें ते मालेगांवास गेले. तेथे त्यांच्या मित्राने सांगितलें कीं, माझ्या कचेरीतील उपाध्ये नांवाच्या कारकुनाच्या घरीं जुने कागद आहेत व ते आपल्याला कागदपत्र देण्यास तयार आहेत. पण आपणास त्यांचे घरी रात्रीं बारा वाजतां गेलें पाहिजे. कारण हे कागदपत्र एका जस्तो पेटींत असून ती पेटी जमिनीत पुरलेली आहे. मागें हे कागद हाती लागण्याची कै. रानड्यांनी खटपट केली होती. पण त्यांना त्या वेळीं यश आलें नाहीं व--<noinclude>÷ रा. चांदोरकर यांच्या जवळचे सर्व अस्सल कागदपत्र व त्यांनीं जमविलेली सर्व माहिती या लेखकाला त्यांनी मोठ्या आनंदानें दिली व त्या कागदपत्राचा व माहितीचा या पुस्तकांत उपयोग करण्याची परवानगी दिली याबद्दल लेखक त्यांचा फार ऋणी आहे. या कागदपत्रांचें व माहितीचे अभावीं या लेखांतलें हें शेवटचें कलम इतक्या निश्चित स्वरूपांत लिहितां आलेंच नसतें.</noinclude>
eo24ntr8hqtx3qqxidqo5v14zd4hnn0
230873
230872
2026-06-07T11:47:29Z
JayashreeVI
4058
230873
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१०६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}या प्रश्नावर प्रकाश पाडणारा व या प्रश्नाचें निश्चित उत्तर देणारा पुरावा महाराष्ट्र इतिहासाचा व महाराष्ट्रीय जुन्या वाङ्मयाचा मोठ्या आस्थेनें व कळकळीनें शोध करणारे व त्याचा काळजीपूर्वक अभ्यास
करणारे धुळ्यांचे ÷रा. चांदोरकर यांना सांपडल्यावर त्यांनीं तो अंशतः केसरींत प्रसिद्ध केला आहे. या पुराव्याचा निर्विकार व शांत मनानें विचार केला असतां रामदासांच्या व शिवाजीच्या भेटीच्या कालाचा वाद शिल्लक रहातच नाहीं. पण रामदास व शिवाजी यांचा संबंध कशा प्रकारचा होता याबद्दल आधच एक ठाम मत बनविल्यामुळे रा. देव व रा. राजवाडे यांनी हा वाद चालू ठेवला आहे किंवा आपल्या पहिल्या प्रश्नावरील मताला अनुरूप असा पुरावा पुढें सांपडेल अशा भरंवशावर ते सांप्रदायिक कालालाच चिकटून राहिले आहेत.

{{gap}}रा. चांदोरकरांना या कागदपत्रांचा शोध कसा लागला ही हकीकत मनोरंजक असल्यामुळे ती येथे देणें अप्रस्तुत होणार नाहीं.

{{gap}}रा. चांदोरकरांच्या मालेगांवच्या एका एंजिनीयर मित्राची त्यांना एकाएकीं मालेगांवास ताबडतोब निघून या ह्मणून तार आली. त्याप्रमाणें ते मालेगांवास गेले. तेथे त्यांच्या मित्राने सांगितलें कीं, माझ्या कचेरीतील उपाध्ये नांवाच्या कारकुनाच्या घरीं जुने कागद आहेत व ते आपल्याला कागदपत्र देण्यास तयार आहेत. पण आपणास त्यांचे घरी रात्रीं बारा वाजतां गेलें पाहिजे. कारण हे कागदपत्र एका जस्तो पेटींत असून ती पेटी जमिनीत पुरलेली आहे. मागें हे कागद हाती लागण्याची कै. रानड्यांनी खटपट केली होती. पण त्यांना त्या वेळीं यश आलें नाहीं व--<noinclude>
{{gap}}÷ रा. चांदोरकर यांच्या जवळचे सर्व अस्सल कागदपत्र व त्यांनीं जमविलेली सर्व माहिती या लेखकाला त्यांनी मोठ्या आनंदानें दिली व त्या कागदपत्राचा व माहितीचा या पुस्तकांत उपयोग करण्याची परवानगी दिली याबद्दल लेखक त्यांचा फार ऋणी आहे. या कागदपत्रांचें व माहितीचे अभावीं या लेखांतलें हें शेवटचें कलम इतक्या निश्चित स्वरूपांत लिहितां आलेंच नसतें.</noinclude>
g82iscw1rs3qu0g7qc9sgz8fdm3qxo9
230874
230873
2026-06-07T11:48:08Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230874
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१०६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>{{gap}}या प्रश्नावर प्रकाश पाडणारा व या प्रश्नाचें निश्चित उत्तर देणारा पुरावा महाराष्ट्र इतिहासाचा व महाराष्ट्रीय जुन्या वाङ्मयाचा मोठ्या आस्थेनें व कळकळीनें शोध करणारे व त्याचा काळजीपूर्वक अभ्यास
करणारे धुळ्यांचे ÷रा. चांदोरकर यांना सांपडल्यावर त्यांनीं तो अंशतः केसरींत प्रसिद्ध केला आहे. या पुराव्याचा निर्विकार व शांत मनानें विचार केला असतां रामदासांच्या व शिवाजीच्या भेटीच्या कालाचा वाद शिल्लक रहातच नाहीं. पण रामदास व शिवाजी यांचा संबंध कशा प्रकारचा होता याबद्दल आधच एक ठाम मत बनविल्यामुळे रा. देव व रा. राजवाडे यांनी हा वाद चालू ठेवला आहे किंवा आपल्या पहिल्या प्रश्नावरील मताला अनुरूप असा पुरावा पुढें सांपडेल अशा भरंवशावर ते सांप्रदायिक कालालाच चिकटून राहिले आहेत.

{{gap}}रा. चांदोरकरांना या कागदपत्रांचा शोध कसा लागला ही हकीकत मनोरंजक असल्यामुळे ती येथे देणें अप्रस्तुत होणार नाहीं.

{{gap}}रा. चांदोरकरांच्या मालेगांवच्या एका एंजिनीयर मित्राची त्यांना एकाएकीं मालेगांवास ताबडतोब निघून या ह्मणून तार आली. त्याप्रमाणें ते मालेगांवास गेले. तेथे त्यांच्या मित्राने सांगितलें कीं, माझ्या कचेरीतील उपाध्ये नांवाच्या कारकुनाच्या घरीं जुने कागद आहेत व ते आपल्याला कागदपत्र देण्यास तयार आहेत. पण आपणास त्यांचे घरी रात्रीं बारा वाजतां गेलें पाहिजे. कारण हे कागदपत्र एका जस्तो पेटींत असून ती पेटी जमिनीत पुरलेली आहे. मागें हे कागद हाती लागण्याची कै. रानड्यांनी खटपट केली होती. पण त्यांना त्या वेळीं यश आलें नाहीं व--<noinclude>
{{gap}}÷ रा. चांदोरकर यांच्या जवळचे सर्व अस्सल कागदपत्र व त्यांनीं जमविलेली सर्व माहिती या लेखकाला त्यांनी मोठ्या आनंदानें दिली व त्या कागदपत्राचा व माहितीचा या पुस्तकांत उपयोग करण्याची परवानगी दिली याबद्दल लेखक त्यांचा फार ऋणी आहे. या कागदपत्रांचें व माहितीचे अभावीं या लेखांतलें हें शेवटचें कलम इतक्या निश्चित स्वरूपांत लिहितां आलेंच नसतें.</noinclude>
p1m8ln0n6mozjhqv5o8maih3lo19c63