विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.5
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३६
104
73602
230911
164728
2026-06-09T02:57:48Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230911
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५०८}}</noinclude>बसले होते. मराठ्यांचे स्वराज्य पुन्हा सिद्ध होऊ द्यावयाचे नाही, असाच त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्याशी लढणे शाहू छत्रपतींना भागच पडत होते. याच वेळी ताराबाई शाहूराजांचा हक्क नाकारीत होत्या. म्हणून त्यांच्याशी लढाई करावी लागतच होती. आणि सगळ्यांत मोठे दुर्दैव म्हणजे सेनापतीसकट मोठमोठे बलवान मराठा सरदार मोगलांना जाऊन मिळत होते. तसे नसते, ते शाहूछत्रपतींच्या मागे संघटितपणे उभे राहिले असते, तर बादशाही सनदेने स्वराज्य चालविण्याचे छत्रपतींना कारणच पडले नसते. येथील सुभेदारांना जिंकून त्यांनी स्वतःच्या बळावर स्वराज्य पुन्हा स्थापिले असते. पण असा स्वराज्याभिमान त्या मराठा सरदारांना नव्हता. ताराबानईंनाही नव्हता. राजारामांच्या मृत्यूपासूनच त्या बादशहाकडे अर्ज करीत होत्या. त्यामुळे, शाहूराजांनी मांडलिकी स्वीकारली व ताराबाई मात्र स्वतंत्र राज्य करणार होत्या, असा पक्ष मांडण्यात कसलाच अर्थ नाही. त्या काळच्या मराठा सरदारांनाही त्याचे महत्त्व वाटत नव्हते. शाहू, ताराबाई व मोगल यांत कोण बलिष्ट ठरतो याचा अदमास ते पहात होते व त्याप्रमाणे कधी इकडे तर कधी तिकडे असे करीत होते. स्वराज्याचे कसलेही सोयरसुतक त्यांना नव्हते. भरभक्कम वतने मिळून जास्तीत जास्त वैयक्तिक वार्थ जेथून साधेल तो त्यांचा पक्ष. म्हणून मोगलांचा जोर दिसताच, ते त्यांना जाऊन मिळाले. त्यामुळेच, बादशाही सनदेनेच आम्हांला स्वराज्य मिळाले आहे, असे दाखवून, मोगल सुभेदार व हे सरदार याच्या मागचा बादशाही पाठिंबा शाहूराजांना आपल्या मागे उभा करावा लागला.
{{gap}}पण असे कोणतेही कारण असले तरी मराठ्यांचे स्वराज्य हे पूर्ण स्वतंत्र राज्य आता राहिले नाही हे मान्य केलेच पाहिजे. पुढे नानासाहेब पेशव्याने १७४३ साली माळव्याची सनद मिळविली त्याचा हाच अर्थ आहे. आणि १७९२ साली महादजी शिंदे यांनी वकील मुतलकी हा अधिकार पेशव्यांसाठी व मीरबक्षीगिरी स्वतःसाठी आणली याचाही अर्थ पेशवे बादशहाचे अंकित होते हाच होतो. प्रत्यक्षात ही अंकितता कितपत होती याचा विचार पुढे करू. पण पूर्ण स्वातंत्र्य येथून पुढे राहिले नाही हे नाकारता येईल असे वाटत नाही.

'''बाळाजी विश्वनाथ'''
{{gap}}पेशवाईचा उदय कसा झाला आणि त्या सत्तेला कोणते स्वरूप प्राप्त झाले याचा विचार आपण करीत आहोत. तसे करताना शाहू छत्रपतींच्या प्रारंभीच्या काळातील परिस्थितीचा आपण विचार केला. मराठ्यांच्यांत फूट पाडण्याची मोगलांची वृत्ती, ताराबाईनी माजविलेली दुही आणि प्रमुख मराठा सरदारांची दुही आणि फितुरी या परिस्थितीतून पेशवाईचा उदय झाला. अर्थात, त्या उदयाला मूळ कारण बाळाजी विश्वनाथ याचे कर्तृत्व हे होय, हे उघडच आहे. वरील परिस्थितीत त्याने हे बुडते तारू कसे सावरले ते आता पाहू.
<noinclude></noinclude>
edfc9gfh0wpxtzpw2fulqtc1yl8mxkp
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३७
104
73603
230912
164729
2026-06-09T03:01:00Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230912
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५०९|| पेशवाईचा उदय}}</noinclude>{{gap}}बाळाजी विश्वनाथ हा १६९९ सालापासून सात आठ वर्षे पुणे प्रांताचा सुभेदार म्हणून काम करीत होता. त्याच्या आधी दहापंधरा वर्षे तरी तो श्रीवर्धनहून वरघाटी आला असला पाहिजे. सेनापती धनाजी जाधवाच्या हाताखाली त्याने कारभारी (कारकून) म्हणूनही काम केले होते. शाहूराजे आणि येसूबाई मोगली कैदेत असताना त्यांची देखभाल नीट करण्याची कसोशी बाळाजी करीत असे. अनेक मोगल सरदारांशी त्याच्या ओळखी होत्या. त्यांच्या मार्फत तो आपली कामे करून घेत असे. पुणे प्रांतीचा सुभेदार असताना वसूल, न्यायनिवाडे, देवस्थानची इनामे, आणि क्वचित युद्धप्रसंग ही बहुविध कामे तो करीत असे. त्यामुळे अष्टप्रधान व इतर मराठा सरदार यांच्याशी त्याचा उत्तम परिचय होत असे.
{{gap}}शाहूराजे कैदेत असताना बाळाजीची ही कर्तबगारी पहात होते. ज्योत्याजी केसकर, बंकी गायकवाड इ. मध्यस्थांमार्फत त्यांचा त्याच्याशी संबंधही येत असे. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांनी हा माणूस हेरून ठेवला असला पाहिजे. पुढे खेडच्या लढाईच्या आधी ताराबाईच्या पक्षाच्या अनेक असामींची मने त्याने शाहूपक्षाला वळविल्याचे त्यांच्या ध्यानात आले होते. त्यामुळे राज्याभिषेक होताच, त्यांनी बाळाजीला सेनाकर्ते हे पद देऊन, पैसा जमवून सेना उभारण्याचे अत्यंत जबाबदारीचे व जोखमीचे काम त्याच्याकडे दिले. बाळाजीच्या कर्तृत्वाच्या खऱ्या विकासाला तेथूनच प्रारंभ झाला आणि महाराष्ट्र राज्य हे ध्येय डोळ्यांपुढे बाळगून, शाहू छत्रपतींच्या ठायी अचल निष्ठा ठेवून, त्याने अखेरपर्यंत कार्य केल्यामुळे त्याला मराठ्यांच्या राज्यरक्षणाचे अवघड कार्य करता आले.

'''इतर सरदार'''
{{gap}}वास्तविक त्या वेळी रामचंद्रपंत अमात्य, परशुरामपंत प्रतिनिधी, शंकराजी नारायण, चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, रावरंभा निंबाळकर, कृष्णराव खटावकर, हिंदुराव घोरपडे, खंडेराव दाभाडे, दामाजी थोरात असे अनेक मोठे कर्ते पुरुष स्वराज्यात होते. पण स्वराज्य हा ध्येयवाद, अचल निष्ठा आणि संघटनविद्या या गुणांत ते या ना त्या कारणाने उणे पडले. आणि त्यांचे कर्तृत्व वाया गेले. ते दुर्मिळ गुण बाळाजीने प्रगट केल्यामुळेच पुढल्या मराठी वैभवाचा पाया घातला गेला.

'''द्विधा मन'''
{{gap}}रामचंद्रपंतांच्या अलौकिक कर्तृत्वाचे वर्णन मागे केलेलेच आहे. ताराबाईंनी १७०० साली शाहूविरुद्ध भूमिका घेतल्यामुळे त्याचे मन द्विधा झाले. आणि त्याचे कर्तृत्व ऱ्हास पावू लागले. शाहू सुटून आल्यावर ताराबाईंनी सर्व मोठमोठ्या सरदारांकडून दूध- भातावर हात ठेवून एकनिष्ठेच्या शपथा घेवविल्या. मनातून ताराबाईवर निष्ठा नसताना अमात्याने ती शपथ घेतली. त्यामुळे तो जास्त खालावला. त्यातच त्याने शाहू-<noinclude></noinclude>
llvqe52405h4i4n5pk89tjrt7brfxt0
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३८
104
73604
230913
164732
2026-06-09T03:01:13Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230913
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५१०}}</noinclude>राजांना एक उत्तेजनपर निरोप पाठविला. त्यामुळे ताराबाईंनी त्याला बेड्या घातल्या. पुढे साताऱ्यावर परशुरामपंत कैदेत पडला, तेव्हा त्याला मुक्त करून ताराबाईंनी पुन्हा अधिकार दिले. नंतर कोल्हापूर- संभाजीने ताराबाईला कैद केल्यावर अमात्यांनी त्याचा पुरस्कार केला असला पाहिजे. कारण त्याचे आज्ञापत्र त्याला उद्देशून लिहिले आहे. ताराबाईंना प्रारंभापासून ठाम विरोध करण्याचे धैर्य रामचंद्रपंताने दाखविले असते, तर त्याचे कर्तृत्व वाया गेले नसते व मराठी राज्याची हानी झाली नसती.
{{gap}}शंकराजी नारायण याने अमात्याप्रमाणेच शपथ घेतली होती. त्याला शाहू राजाचे पत्र गेले की भेटीस येतो. तेव्हा त्याचे मन अगदी द्विधा झाले व त्याने आत्महत्या केली. परशुरामपंत प्रतिनिधी याने प्रथम ताराबाईंशी खंबीर निष्ठा ठेवली. पण शाहूराजांनी कैदेत टाकल्यावर त्याने पक्ष बदलला. शाहू छत्रपतींनी त्यास प्रतिनिधिपदही दिले. पण पुढे तो पुन्हा ताराबाईंना मिळाला. आणि पुन्हा कैद केल्यावर पुन्हा शाहुराजांचा सेवक झाला. मराठी स्वराज्यावर या तीनही पुरुषांची निष्ठा होती. स्वार्थ त्यांना सुटला नव्हता हे खरे, पण फितुरीचा विचार त्यांच्या मनात आला नाही. पण ठाम निश्चय नाही, धरसोड, अविवेक यांमुळे त्यांचे कर्तृत्व वाया गेले.

'''एकमेव आधार'''
{{gap}}पण वर निर्देशिलेले जाधव- निंबाळकरादी जे सरदार त्यांचे कर्तृत्व, उच्च ध्येय, स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा यांच्या अभावी स्वराज्याला घातकच ठरले. शिवाय याच सुमाराला सेनापती धनाजी जाधव, परसोजी भोसले हे शाहुपक्षाचे कर्ते पुरुष, आणि मोगल दरबारात राहून शाहूराजांचे कार्य साधणारा, मोगल मनसबदार रायभानजी भोसले हे मृत्यू पावले. अशा या काळात शाहुछत्रपतींशी व स्वराज्याशी एकनिष्ठ राहून, सर्व आपत्तींना तोंड देऊन, त्यांवर मात करून, छत्रपतींना स्थिरपद करणारा एकमेव पुरुष म्हणजे बाळाजी विश्वनाथ. त्याने हे कार्य कसे केले ते आता पाहावयाचे आहे.

'''सामर्थ्य कशात ?'''
{{gap}}बाळाजी हा सेनापती नव्हता, रणनिपुण नव्हता. त्याचे सर्व सामर्थ्य मुत्सद्देगिरी, समयज्ञता, वाक्चातुर्य, युक्तिवाद यांत होते. मोठमोठ्या सरदारांना, सावकारांना आपल्या पक्षाला वळविणे, शत्रूचे बलाबल व मर्मस्थान जाणणे, शत्रूमित्रभाव योग्य रीतीने जोपासणे, अखंड सावध राहून योग्य वेळी पाऊल टाकणे आणि अत्यंत चतुराईने मोहरी व प्यादी हालवून शत्रूवर मात करणे यांत तो निपुण होता. या बळावरच तो यशस्वी झाला. अर्थात हे यश त्याला सुखासुखी मिळाले नाही. त्या धडपडीत त्याच्यावर अनेक कठीण प्रसंगही आले. त्याचे अनेक डाव अयशस्वी झाले, अंगावर उलटले. पण या सर्वातून त्याने जिद्दीने, धैर्याने मार्ग काढला व अखेर जिंकली.
<noinclude></noinclude>
ipve5iz8v4bpjnphms5h6o5nmqilpdn
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३९
104
73605
230914
164733
2026-06-09T03:01:26Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230914
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५११|| पेशवाईचा उदय}}</noinclude>
'''धनाजीचा मुलगा'''
{{gap}}चंद्रसेन जाधव हा सेनापती धनाजी जाधव याचा मुलगा. धनाजीच्या मृत्यूनंतर शाहूछत्रपतींनी त्याला सेनापती नेमले. पण धनाजी हा स्वराज्याचा सर्वांत मोठा हितकर्ता होता, तर चंद्रसेन स्वराज्याचा सर्वांत मोठा शत्रू झाला. आरंभी शहागड, फत्यावाद अशा काही लढाया त्याने शाहू छत्रपतींच्या साठी जिंकल्या. पण जाधव, निंबाळकर, थोरात इ. सरदारांना ताराबाई आणि मोगल सुभेदार दाऊदखान यांच्याकडून सारखी विलोभने येऊ लागली, जागिरी, वतने, मनसबी यांची आश्वासने येऊ लागली. त्यामुळे त्यांची मने डळमळली आणि या तिघांतील जो भारी ठरेल त्याला मिळावयाचे असा विचार त्यांनी केला. शाहू किंवा ताराबाई यांच्या मागे उभे राहून आपण स्वराज्य-पक्ष भारी करावयाचा आहे असा ध्येयवाद त्यांच्या मनात नव्हता. त्यामुळे मोगलांकडून आश्वासने येताच त्यांनी शाहूछत्रपतींशी कुरापती काढून भांडणे करण्यास प्रारंभ केला.
{{gap}}सरदेसाई लिहितात, खानाशी बळकट संधान सिद्ध झाल्यावरच चंद्रसेनाने शाहूकडे दरडावणी चालू केली. आणि, ताराबाईंना एका पत्रात चंद्रसेनाने स्वतःच लिहिल्याप्रमाणे, दमाजी थोरात, शहाजी निंबाळकर, संताजी पांढरे, खंडेराव दाभाडे, परशुरामपंत प्रतिनिधी, मानसिंग मोरे, यांची मने शाहूविरुद्ध वळवून, सर्वांनी साताऱ्यावर चालून जाण्याचा कट केला. ही कारस्थाने चालू असतानाच बंडखोर सरदारांच्या बंदोबस्तासाठी शाहू छत्रपतींनी चंद्रसेन व बाळाजी यांना पाठविले होते. त्या वेळी एका क्षुल्लक कारणावरून त्याने बाळाजीला कैद करण्याचे ठरविले, तेव्हा बाळाजी आपले लष्कर घेऊन साताऱ्यास गेला. त्या वेळी चंद्रसेनाने शाहूछत्रपतींना धमकी दिली की स्वामींनी बाळाजीस आमच्या स्वाधीन करावे, नाही तर आम्हांस महाराजांचे पाय सुटतील. या उद्धटपणाचे प्रायश्चित्त देण्याचे ठरवून छत्रपतींनी हैबतराव निंबाळकर यास त्याच्यावर पाठविले. जेऊरच्या लढाईत हैबतरावाने त्याचा पुरा मोड केला (१७११). तेव्हा चंद्रसेन उघडपणे प्रथम ताराबाईस आणि दोनच महिन्यांनी (ऑगस्ट १७११) दाऊदखानास मिळाला.

'''खटावकर'''
{{gap}}याच वेळी खटावकरांनी दंगा सुरू केला. हे घराणे पूर्वापार मोगलांचे मनसबदार होते. स्वराज्यस्थापनेनंतरही अनेक घराणी मोगलांनाच आपले धनी समजत असत. त्यांतलेच हे एक. शाहूछत्रपतींनी बाळाजीस कृष्णराव खटावकर यावर पाठविले. या वेळी परशुरामपंत साताऱ्यास कैदेत होता. शाहूछत्रपतींची मर्जी सुप्रसन्न करून घेण्यासाठी त्याने आपला मुलगा श्रीपतराव यास बाळाजीबरोबर दिले. लढाईत कृष्णराव मारला गेला. त्याच्या मुलांना क्षमा करून शाहूराजांनी त्यांच्याकडे वतन कायम ठेविले.
<noinclude></noinclude>
j72jdckdmzqnjpft2dm3u3d7kyrsabg
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४०
104
73606
230915
164734
2026-06-09T03:01:54Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230915
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५१२}}</noinclude>
'''वैयक्तिक धर्म'''
{{gap}}तत्कालीन धर्मकल्पनेचे स्वरूप लक्षात यावे म्हणून खटावकर घराण्याच्या धार्मिक वृत्तीची कल्पना येथे देतो. खटावकर हे देशस्थ ब्राह्मण. संस्कृत विद्येविषयी त्यांचा मोठा लौकिक होता. स्वतः कृष्णराव हा विद्वान असून विष्णुसहस्रनामावर द्वैतमताची टीकाही त्याने लिहिली होती. शंभुछत्रपतींच्या वधानंतर औरंगजेबाने कृष्णरावाला खटावची जहागीर दिली. ती स्वीकारण्यात त्याची विष्णुभक्ती कोठे आड आली नाही. खटाव येथे याने एक दत्तमंदिर बांधले. जेजुरीचा खंडोबा हे याचे कुलदैवत होते. तेथले सध्याचे मंदिर यानेच बांधले आहे. या घराण्यातले अनेक पुरुष विद्वान आणि साधुवृत्तीने राहणारे होते, असा त्यांचा लौकिक आहे.
{{gap}}शिवछत्रपतींनी स्वधर्म व स्वराज्य यांचे ऐक्य मानून लोकांवर ते संस्कार केले, दुष्ट, तरुक यांची सेवा हा अधर्म होय, अशी शिकवण दिली, ती मराठा समाजात कितपत रुजली ते यावरून ध्यानात येते. तुरुक सेवा हा अधर्म आहे, असे या सरदारांच्या स्वप्नातही कधी आले नाही. त्यांचा धर्म सर्व वैयक्तिक होता. खंडोबा, दत्त यांची मंदिरे बांधणे व परलोकसाधना करणे यापलीकडे धर्माचे काही कार्य आहे, असे त्यांना वाटतच नव्हते. धारणात् धर्मः।, प्रभवार्थाय लोकानां धर्मस्य नियमः कृतः।, हे विचार त्यांच्या मनाला कधी शिवलेच नाहीत. धर्माचे सामाजिक स्वरूप त्यांनी कधी जाणलेच नाही.
{{gap}}आणि जे देवधर्माच्या क्षेत्रात तेच राजकारणाच्या पराक्रमाच्या क्षेत्रात होते. मराठा सरदार आणि एकंदर हिंदू समाज हा समाज म्हणून जगायला कधी शिकलाच नाही. हे सर्व सरदार व्यक्ती म्हणूनच जगत होते. व्यक्तिगत मोक्ष हा कितीही उच्च असला तरी तो व्यक्तिगत स्वार्थच आहे, असे लो. टिळकांनी म्हटले आहे. हे पारलौकिक क्षेत्रात जर खरे आहे तर ऐहिक क्षेत्रात ते त्याच्या दसपटीने, शतपटीने खरे आहे. पण हिंदूंचे ऐहिक क्षेत्रातले जीवन असेच आहे. धर्मात ते जसे व्यक्ती म्हणून जगतात तसेच इहलोकात, राजकीय क्षेत्रातही व्यक्ती म्हणूनच जगतात.

'''दमाजी थोरात'''
{{gap}}दमाजी थोराताचे उदाहरण पहा. रामचंद्रपंताने यास प्रथम पुढे आणिले. पुणे व सुपे हे दोन परगणे त्यास जागीर म्हणून दिले होते. १७०८ साली शाहूछत्रपतींच्या भेटीस तो व रंभाजी निंबाळकर गेले असताना त्यांनी उद्धट वर्तन केले व तेव्हापासून त्यांनी स्वराज्यात दंगा सुरू केला. काही दिवस त्यांनी ताराबाईचा पुरस्कार केला, आणि त्या १७१४ साली कैदेत पडताच ते मोगलांना जाऊन मिळाले.
{{gap}}दक्षिणेच्या कारभारावर प्रथम दाऊदखान, नंतर निजाम व त्यानंतर हुसेन अल्ली असे मोगल सुभेदार होते. त्या सर्वास हे मराठा सरदार नमून वागत. १७१६ साली हुसेन अल्लीने पोशाख देऊन थोरातबंधूंचा गौरव केला व त्यांना बादशाही सेवेत घेतले.
<noinclude></noinclude>
tnvy2emh4sg2epujg87eq5um23m3313
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४१
104
73607
230916
164735
2026-06-09T03:02:06Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230916
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५१३|| पेशवाईचा उदय}}</noinclude>
'''निष्ठेअभावी'''
{{gap}}१७१६ साली जाधव, निंबाळकर, थोरात, मुहकमसिंग, तुरुकजातखान यांनी साताऱ्यावर चालून जाण्याची मोहीम आखली होती आणि रोहिडेश्वर, लोणी- भापकर येथपर्यंत ते आलेही होते. चंद्रसेनाने शाहूस व दमाजीने बाळाजीस पकडून द्यावयाचे असा मोगलांनी व्यूह रचला होता. पण बाळाजीने दाभाडे, मोरे, शिवदेव, सुलतानजी निंबाळकर यांच्या सेना एकत्र करून तो मोडून काढला. याचसाठी 'अतुल पराक्रमी सेवक' म्हणून शाहूछत्रपतींनी बाळाजीचा गौरव केलेला आढळतो. याच सुमारास दमाजी थोराताकडे शाहूपक्षामार्फत बोलणे करण्यास बाळाजी गेला होता. थोराताकडून त्याने आधी बेलभंडाराची शपथही आणविली होती. पण भेटीस येताच थोराताने बाळाजीस कैद केलं आणि जबर दंडाची मागणी केली. शपथेची आठवण देताच तो म्हणाला, बेल म्हणजे झाडाचा पाला, आणि भंडार म्हणजे रोजची खायची हळद! त्याचे काय महत्त्व! शेवटी सावकारांकडून पैसा जमवून दंड भरला, तेव्हा बाळाजीची सुटका झाली. १७१८ साली बाळाजी पेशव्याचा व सय्यद हुसेन अली यांचा तह ठरला. त्याबरोबर तिकडून तोफखाना आणून बाळाजीने दमाजी थोरातावर चाल केली. त्यास कैद केले आणि त्याच्या हिंगणगावच्या गढीवर नांगर फिरविला. पण वर्षभराने कैदेतून सुटल्यावर थोराताने पूर्वीचाच उद्योग आरंभिला. त्यामुळे पुन्हा तो कैदेत पडला व तेथेच मृत्यू पावला.

'''भालेराई'''
{{gap}}हिंदुराव घोरपडे, रंभाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण या सरदारांच्या कथा काहीशा याच स्वरूपाच्या आहेत. स्वातंत्र्ययुद्धाच्या काळी भालेराई निर्माण झाली म्हणून मागे सांगितले आहे. त्या भालेराईचीच ही पुढली परंपरा आहे. या सरदारांना आपल्यावर कोणाची सत्ता म्हणून नको होती. स्वराज्य, स्वातंत्र्य, मराठ्यांचा उत्कर्ष याचे कसलेही सोयरसुतक यांना नव्हते. लष्कर जमवावे, चौफेर लुटालूट करावी, कधी दंडेलीने चौथाई, कधी सरदेशमुखी वसूल करावी, असा त्यांचा जीवनक्रम होता. या धोरणात ज्या वेळी ज्या पक्षाला मिळावेसे वाटेल त्याला ते मिळत आणि कार्यभाग झाला की पुन्हा उधळून जात. बाळाजीने मोगल बादशहाकडून सनदा आणल्यावर हे सरदार जरा नरम पडले. स्वराज्याला स्थैर्य येऊन त्याची शक्ती वाढल्यामुळेही त्यांचा जोर हटला. पण खरे म्हणजे याचा बंदोबस्त पूर्णपणे केव्हाच झाला नाही, कारण कोल्हापूरचा संभाजी, निजाम आणि पेशव्यांचे इतर हितशत्रू यांचा अशा सरदारांना नेहमीच पाठिंबा असे, त्यामुळे भालेराई कधी संपली नाही, आणि अराजक निमाले नाही. मराठी स्वराज्याचे साम्राज्य झाले तरी त्यातही हीच स्थिती होती. आणि याचे मुख्य कारण म्हणजे धर्म, स्वराज्य, स्वातंत्र्य यासंबंधीच्या निष्ठा या समाजाला शिकवून<noinclude>
{{gap}}३३</noinclude>
b7vqbwamn9ohf2e4myl7rkfc13esvki
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४२
104
73608
230917
164736
2026-06-09T03:02:18Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230917
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५१४}}</noinclude>त्याला ' संगच्छध्वम्', 'संवदध्वम्' असे वळण लावून, एकजीव, संघटित समाज असे रूप देणारा नेता येथे निर्माणच झाला नाही.
{{gap}}अशा या अराजकातून, बेबंदशाहीतून काही प्रमाणात मराठा शक्ती संघटित करण्यात व टिकविण्यात बाळाजीला व पुढे पेशव्यांना यश मिळाले, म्हणून शंभर एक वर्षे तरी मराठ्यांचा उत्कर्ष होत गेला.

'''कान्होजीला वळविले'''
{{gap}}अशी शक्ती संघटित करण्याच्या बाळाजीच्या प्रयत्नातील सर्वात मोठा, अत्यंत यशस्वी व अत्यंत लाभदायक असा प्रयत्न म्हणजे कान्होजी आंग्रे याला स्वराज्य- पक्षाला वळविण्याचा होय. १६९८ सालापासून मराठा आरमाराचा कान्होजी हा प्रमुख होता. त्याला राजारामांनी सरखेल ही पदवी दिली होती. आणि आपल्या पराक्रमाने त्याने पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज या नाविक सत्तांना दहशत बसविली होती. असा हा कान्होजी शाहूराजे दक्षिणेत आल्यावर प्रथम त्यांना मिळाला होता. पण पुढे चंद्रसेनाच्या कारस्थानामुळे तो ताराबाईकडे गेला. अर्थात त्याचा बंदोबस्त करणे आले. शाहूछत्रपतींनी त्याच्यावर पेशवा बहिरोपंत पिंगळे यास पाठविले; पण कान्होजीने एकदम वरघाटी येऊन लोहगड किल्ला घेतला व बहिरोपंतास कैद केले. ही १७१३ सालची गोष्ट. या वेळी वरील आपत्तीमुळे शाहूराजांना आभाळ फाटल्यासारखे झाले. कारण विश्वासाचा व कर्ता असा एकही सरदार त्यांच्याजवळ या वेळी राहिला नव्हता. अशा वेळी बाळाजी पुढे झाला व आंग्ऱ्यांच्यावर चालून जाण्याची जोखीम त्याने पत्करली. मात्र त्याने, मला काही मोठे अधिकारपद दिलेत तर माझ्या शब्दाला प्रतिष्ठा येईल, असे छत्रपतींना सांगितले. ते त्यांना पटून त्यांनी १८ नोव्हेंबर १७१३ रोजी बाळाजीस पेशवाईची वस्त्रे दिली. अधिकार मिळताच बाळाजीने कान्होजीच्या बंदोबस्ताचे काम सुरू केले. मात्र ते त्याच्या पद्धतीने. येवढ्या बलाढ्य सरदाराला लष्करी बळाने जिंकणे अशक्य आहे, हे बाळाजी जाणत होता. म्हणून त्याने आपली माणसे पाठवून कान्होजीला परिस्थिती व शत्रुमित्रांचे बलाबल याची यथार्थ कल्पना दिली. ताराबाईच्या पक्षात आता काही अर्थ राहिला नव्हता. पश्चिमेच्या नाविक सत्तांचे बळ वाढत होते. अशा वेळी शाहू छत्रपतींचा व सर्व स्वराज्याचा पाठिंबा त्याला लाभला तर त्याला वाटेल तो पराक्रम करता येईल, हे बाळाजीने कान्होजीला पटवून दिले. आणि कुलाब्याला जाऊन त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन, 'महाराजांचे चाकर होऊन कृपा संपादून घ्यावी' हा विचार त्याच्यापुढे मांडला. कान्होजीला तो मान्य झाला. आणि पश्चिमेचा हा बलाढ्य सरदार स्वराज्याचा आधारस्तंभ झाला. ताराबाईचा पक्ष नामशेष करून टाकणे आणि स्वराज्याची पश्चिम दिशा निर्धास्त करून टाकणे ही दोन कामे बाळाजीने या उद्योगाने साधली. त्यामुळे महाराष्ट्रात त्याची प्रतिष्ठा मोठ्या प्रमाणात वाढली. आणि पेशवा हे एक नवे सामर्थ्य महाराष्ट्रात निर्माण झाले.
<noinclude></noinclude>
l553qqi65lpiru31k7l1tfeywmck0ym
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४३
104
73609
230918
164737
2026-06-09T03:02:33Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230918
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५१५|| पेशवाईचा उदय}}</noinclude>
'''ग्रहयोग'''
{{gap}}येथून पुढे शाहू छत्रपतींच्या पक्षाला ग्रहयोग जरा अनुकूल असे होऊ लागले १७१४ च्या फेब्रुवारीत आंग्रे त्या पक्षाला मिळाले आणि त्याच सालच्या ऑगस्ट- मध्ये ताराबाईना त्यांचा सावत्र मुलगा राजसबाईचा पुत्र संभाजी याने कैदेत टाकले आणि कोल्हापूरला आपली स्वतंत्र गादी स्थापिली. हा संभाजी काही शाहूपक्षाला अनुकूल होता असे नाही. निजामाला मिळून स्वराज्याविरुद्ध कारस्थाने करणे, एकंदर मराठा समाजाचा, महाराष्ट्राचा, विचार स्वप्नातही न करणे या दृष्टीने वर सांगितलेल्या मराठा सरदारांच्या जातीचाच तो होता. पण या वेळी तरी ताराबाईचा स्वराज्याला होणारा उपद्रव थंड पडण्यास तो कारण झाला. म्हणून हा ग्रहयोग अनुकूल होय, असे म्हटले आहे. वास्तविक या वेळी ताराबाईचा मुलगा शिवाजी हा अठरा वर्षाचा होऊनही कसलीही कर्तबगारी दाखवीत नव्हता. तेव्हा शाहूराजांच्या हाती सत्ता जाण्यातच मराठी राज्याचे हित आहे, हा विचार ताराबाईला कळावयास हवा होता आणि त्यांनी आपले स्वराज्यविघातक उद्योग थांबवावयास हवे होते. पण मराठी राज्याच्या हिताची दृष्टी डोळ्यांपुढे असेल तेव्हा असे विचार संभवतात. ती नसल्यामुळे ही बाई मरेपर्यंत आपले विघातक उद्योग करीतच राहिली होती. आणि विशेष दुर्दैवाची गोष्ट ही की अनेक मराठा सरदार आणि अष्टप्रधानांपैकी काही प्रधानही तिला शेवटपर्यंत साथ देत राहिले.

'''सय्यद बंधू'''
{{gap}}ताराराणी निष्प्रभ झाल्या हा अनुकूल ग्रहयोग असे वर म्हटले. तसाच दिल्लीचा बादशहा फरूकसीयर याने सय्यद हुसेन अली याची दक्षिणच्या सुभ्यावर नेमणूक केली हा दुसरा अनुकूल ग्रहयोग होय. हा ग्रहयोग पहिल्याच्या शतपटीने अधिक लाभदायक होता. सय्यदच्या या नेमणुकीमुळे दक्षिणच्या राजकारणाचा सर्व ओघ बदलून गेला. शाहूछत्रपती व मराठी स्वराज्य यांचे भवितव्य त्यामुळे निश्चित झाले.
{{gap}}१७१२ च्या फेब्रुवारीत बहादूरशहा मरण पावला आणि जहांदरशहा तख्तावर आला. पण १७१३ च्या जानेवारीत त्याला ठार मारून फरुकसीयर बादशहा झाला. या बादशहाला तख्त मिळविण्याच्या कामी सय्यद बंधूंचे फार मोठे साहाय्य झाले होते. ते इतके की पुढे सर्व सत्ताच सय्यद हसन व हुसेन यांच्या हाती गेली आणि बादशहाला त्यांच्याविषयी द्वेष उत्पन्न होऊन तो त्यांच्या नाशाची खटपट करू लागला. त्यातलाच एक डाव म्हणून, त्या बंधूंची जोडी फोडण्यासाठी त्याने हुसेन अलीची दक्षिणच्या सुभ्यावर १७१५ च्या मे महिन्यात नेमणूक केली.
{{gap}}त्याच्या आधी निजाम उल्मुल्क दक्षिणचा सुभेदार होता. तो मराठ्यांचा हाडवैरी होता. हुसेन अली काही फार निराळा नव्हता. पण बादशहाने त्याच्या नाशाचे डाव<noinclude></noinclude>
5qzarkhnfnmijbti91g7th9q0a95uyk
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४४
104
73610
230919
164738
2026-06-09T03:02:59Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230919
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५१६}}</noinclude>रचले, तेव्हा नाइलाजाने त्याला मराठ्यांशी दोस्ती करावी लागली. आणि या संधीचा फायदा बाळाजीने घेतला. वर मराठ्यांना हा ग्रहयोग अनुकूल झाला असे म्हटले आहे. पण बाळाजीने अत्यंत मुत्सद्देगिरी लढवून आणि धाडशी डाव टाकून त्यांचा उपयोग करून घेतल्यामुळेच मराठ्यांचा लाभ झाला. नाहीतर अनुकूल योग येऊनही उपयोग होतोच असे नाही.

'''बादशहाला शह'''
{{gap}}हुसेन सय्यद दक्षिणेकडे निघाला तेव्हा, गुजराथेत असलेल्या दाऊदखानास बादशहाने गुप्तपणे हुकूम पाठविला होता की त्यास कारभार न देता मारून टाकावे. त्याप्रमाणे दाऊदखान चालून आलाही; पण लढाईत दाऊदखानच मारला गेला (ऑगस्ट १७१५). हुसेन अलीविरुद्ध बादशहाने मराठ्यांनाही चेतविले होते; त्यामुळे त्यांनी मोगली मुलखावर हल्ले करण्यास प्रारंभ केला होता. हुसेन अलीने त्याशी मुकाबला करण्याचा खूप प्रयत्न केला. पण खंडेराव दाभाडे आणि सुलतानजी निंबाळकर यांनी त्याच्या फौजांचा पूर्ण मोड केला. तेव्हा हुसेन अलीने मराठ्यांशी गोडी करून बादशहालाच शह देण्याचा डाव टाकला आणि मराठ्यांना ती सुवर्णसंधी मिळाली.

'''तह'''
{{gap}}हुसेन अलीने शंकराजी मल्हार याच्या मार्फत शाहूछत्रपतींशी बोलणी सुरू केली. शंकराजी मल्हार पूर्वी राजारामांचा सचिव होता. पण ते पद सोडून तो जिंजीहून काशीस गेला व तेथून दिल्लीला जाऊन तेथे त्याने आपला जम बसविला. तो हुसेन अलीचा कारभारी म्हणूनच दक्षिणेत आला होता. बाळाजी विश्वनाथ आणि चिमणाजी दामोदर यांच्या मध्यस्थीने त्याने शाहूछत्रपतींशी वाटाघाटी चालविल्या आणि त्यांतूनच हुसेन अलीच्या मार्फत छत्रपती आणि बादशहा यांच्यांत तह ठरला. (१) शिवाजीच्या वेळचा स्वराज्याचा मुलूख शाहूच्या हवाली करावा. (२) अलीकडे मराठ्यांनी खानदेश, वऱ्हाड, गोंडवन, हैदराबाद व कर्नाटक या प्रांतांतले काही विभाग जिंकले होते, ते बादशहाने त्यांच्या स्वराज्यात दाखल करून टाकावे. (३) दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून मराठ्यांनी चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क वसूल करावे आणि त्या बदल्यात त्या मुलखात बादशहाचे मदतीसाठी पंधरा हजार फौज ठेवावी. (४) मराठ्यांनी बादशाहाला दरसाल दहा लाख खंडणी द्यावी. आणि (५) शाहूराजांची माता येसूबाई, त्यांचा कुटुंबपरिवार, संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग यांना मुक्त करून स्वदेशी पोचवावे. असा तहाचा मुख्य मतलब होता.
<noinclude></noinclude>
7926ekz60ffxvohqznssxd7zop7kyao
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४५
104
73611
230920
164739
2026-06-09T03:06:45Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230920
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५१७|| पेशवाईचा उदय}}</noinclude>
'''सनदा'''
{{gap}}कराराप्रमाणे खंडेराव दाभाडे याच्या हाताखाली मराठ्यांची फौज औरंगाबादेस आली. याच वेळी दिल्लीचा सय्यद हसन अली अबदुल्ला याचे व बादशहाचे सडकून वाकडे आले, म्हणून त्याने हसन अलीला दिल्लीला बोलाविले. तेव्हा तो मराठ्यांची फौज बरोबर घेऊन निघाला. बादशहाला अर्थातच हे रुचले नाही. त्याने मराठ्यांशी झालेला तह नामंजूर केला आणि आपल्या वगीच्या सरदारांना सेना घेऊन दिल्लीस बोलविले.
{{gap}}याचा अर्थ असा की दिल्लीला एका लढाईचीच तयारी चालू झाली आणि प्रत्यक्षात झालेही तसेच. सय्यद बंधूंची स्वतःची तीस चाळीस हजार फौज होती. शिवाय मराठ्यांची दहाबारा हजार. यामुळे बादशहाच्यातर्फे कोणी सरदार ठाण मांडून उभा राहीना. सय्यद बंधू शहराची नाकेबंदी करून राजवाड्यात शिरले. तेथे कलह विकोपाला जाऊन त्यांनी फरुकसीयरला कैद केले व नव्या बादशहाची स्थापना केली. आणि मग त्याच्याकडुन मराठ्यांशी झालेल्या तहाला मंजुरी देवविली आणि ठरल्याप्रमाणे स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा बाळाजी विश्वनाथाच्या हवाली केल्या. २० मार्च १७१९ रोजी बाळाजी दिल्लीहून निघाला आणि जुलैमध्ये साताऱ्यात येऊन पोचला.
{{gap}}वरील प्रकारच्या सनदांमुळे शाहूछत्रपतींचे आसन स्थिर झाले आणि त्यांच्या राजपदाला अवश्य ती प्रतिष्ठा प्राप्त झाली. चिटणीस लिखित शाहूचरित्राच्या आधारे सरदेसाई यांनी म्हटले आहे की अष्टप्रधान व सरदार त्यांचे हुकूम बिनतक्रार बजावून बाहेर संचार करू लागले. हुजुरांनी बोलाविले असता एका क्षणाचाही विलंब न करता येऊ लागले. सर्व निष्ठेने चालू लागले (पुण्यश्लोक शाहू, पृ. १३८). याचा अर्थ असा की शाहूपक्षाच्या मराठ्यांच्या मताने सुद्धा बादशाही सनदा मिळाल्यामुळेच शाहूराजे हे स्वराज्याचे खरे धनी झाले. मग दक्षिणेतल्या मुसलमान सुभेदार, सरदारांना तसे वाटले असल्यास नवल नाही. सनदांनंतरही निजामासारखे दक्षिणेचे सुभेदार आणि काही सरदार छत्रपतींना जुमानीत नव्हते हे खरे. अनेक मराठा सरदारांनी सुद्धा आपला विरोध सोडला नव्हता. हे सर्व खरे असले तरी शाहू छत्रपतींच्या सत्तेला या सनदांमुळे नैतिक प्रतिष्ठा लाभली, आणि स्वराज्यातील राज्यकारभार आणि दक्षिणच्या सहा मोगली सुभ्यांतील चौथाई- सरदेशमुखीचा वसूल पूर्वीपेक्षा जास्त सुकर झाला हे नाकारता येणार नाही.

'''नवा उद्योग'''
{{gap}}दुसरा मोठा फायदा असा की मराठ्यांना बादशही हुकमानेच एक स्वतंत्र उद्योग मिळाला. बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, कर्नाटक, बेदर आणि हैदराबाद हे मोगलांचे<noinclude></noinclude>
6v76su5yzw3dazer5hozpoz7ddxojdu
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४६
104
73612
230921
164740
2026-06-09T03:07:29Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230921
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५१८}}</noinclude>दक्षिणेतले सहा सुभे. यांतून चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याचा अधिकार मराठ्यांना मिळाला. याच्या बदल्यात मराठयांनी आपली पंधरा हजार फौज बादशहाचे दिमतीम ठेवून तेथला बंदोबस्त राखावा असा करार होता. यामुळे मराठा सरदारांचे लक्ष घरगुती भांडणातून काढून बाहेरच्या उद्योगात लावण्याचा बाळाजीचा हेतू सिद्धीम गेला. आणि मराठ्यांना एक नवीन कार्यक्षेत्र मिळाले; आणि मराठी राज्याचे फार मोठे रूपांतर झाले.

'''सरंजामदारी'''
{{gap}}वतनासक्ती आणि वतनदारी यामुळे सर्व राज्य कसे विस्कळित विघटित झाले ते मांगे सांगितलेच आहे. शाहूराजे छत्रपती झाले, तेव्हा त्यांना अनेक मराठा सरदार अनुकुल झाले तरी त्यांची वतने त्यांच्याकडे जशीच्या तशी कायमच होती. त्यात हस्तक्षेप करून शिवछत्रपतींच्या धोरणाअन्वये वतनदारीवर नियंत्रण घालणे हे शाहू छत्रपतींना सर्वथा अशक्य होते. बादशाही सनदांनंतर मराठ्यांना जो नवा उद्योग मिळाला म्हणून वर सांगितले त्यातून आता सरंजामदारी निर्माण झाली. सरदारांना स्वतंत्र फौज ठेवावयास सांगून तिच्या खर्चासाठी स्वतंत्र मुलूख किंवा प्रदेश त्यांच्याकडे लावून दिले की ती सरंजामदारी होते. आदिलशाहीचे बहुतेक सरदार सरंजामदारच होते. शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापन केल्यावर मात्र स्वतंत्र फौज ठेवण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही. त्या वेळचे मराठा लष्कर हे सर्व छत्रपतींचे लष्कर होते. राजारामांच्या काळी वतनदारी पुन्हा जोरावली, तेव्हा तिला सरंजामदारीचे रूप येऊ लागले. तीच व्यवस्था शाहू छत्रपतींना पुढे चालवावी लागली. त्यांच्याजवळ पैसा नव्हता. वसूल सर्व बंद पडला होता. आणि फौज तर हवी होती. धनाजी जाधव, आंगरे, निंबाळकर, दाभाडे, नागपूरकर भोसले यांना छत्रपतींनी प्रारंभीच मोठमोठे सरंजाम तोडून दिले. हे सरदार व त्यांचे वारस मुजोर झाले, तेव्हा बाळाजीस सेनाकर्ते हो पदवी देऊन छत्रपतींचे लष्कर स्वतंत्रपणे उभारण्याची व्यवस्था त्यांना करावी लागली पण त्यामुळे सरंजामदारीला आळा बसला असे नाही.
{{gap}}बादशाही सनदा मिळाल्यानंतर एकंदर राज्याकारभाराची पद्धत निश्चित करण्याची वेळ आली, तेव्हा शाहुछत्रपती व बाळाजी विश्वनाथ यांना सरंजामदारी व्यवस्था मान्य करूनच पुढे पाऊल टाकावे लागले. त्यावाचून गत्यंतरच नव्हते. असे असल्यामुळे पुढीलप्रमाणे व्यवस्था करण्यात आली.

'''राज्याची वाटणी'''
{{gap}}सरदेशमुखीचे सर्व उत्पन्न हे छत्रपतींचे खाजगी उत्पन्न असे ठरविण्यात आले. उत्पन्नाचा खरा मोठा भाग म्हणजे राज्यातील वसूल आणि मोगली सुभ्यातील चौथाईचा वसूल हा होय. यातील चौथा हिस्सा वसूल हा राजबाबती म्हणून निराळा<noinclude></noinclude>
gfu9gh19ecrsk8bbj1iuym03luff6ux
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४७
104
73613
230922
164741
2026-06-09T03:11:08Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230922
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५१९|| पेशवाईचा उदय}}</noinclude>काढण्यात येई व तो सर्व राजाच्या खर्चासाठी दिला जाई. राहिलेला तीनचतुर्थांश म्हणजे जो पंचाहत्तर टक्के वसूल त्याला मोकासा म्हणत. त्यातून राज्याचा खर्च व्हावयाचा. यातील शेकडा सहा वसूल म्हणजे साहोत्रा आणि शेकडा तीन वसूल म्हणजे नाडगौडा. हा राजाने आपल्या मर्जीप्रमाणे कोणालाही द्यावयाचा असे. आता एकंदर वसुलापैकी ६६ टक्के राहिले. हा भाग प्रदेशाच्या रूपाने निरनिराळ्या सरदारांना वाटून देण्यात आला. खानदेश व बालाघाटचा काही भाग हा पेशव्यांकडे, बागलाण व गुजराथ सेनापतीकडे, सेनासाहेब सुभा कान्होजी भोसले याच्याकडे वऱ्हाड व गोंडवन, सरलष्कराकडे गंगथडी व औरंगाबाद सुभा, प्रतिनिधी-नीरा, वारणा व हैदराबाद, चिटणीस व आंग्रे- कोकण, अशी उद्योगाची वाटणी छत्रपतींनी करून दिली. या प्रदेशांत सरदारांनी फौज ठेवून संचार करावा, वसूल करावा आणि बंदोबस्त ठेवावा अशी व्यवस्था आखण्यात आली.
{{gap}}स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात वतनांच्या आश्वासनांमुळे मराठ्यांना जशी पराक्रमाची स्फूर्ती मिळाली तशीच स्फूर्ती या सरंजामी व्यवस्थेमुळे आता आणि पुढे त्यांना मिळाली. पुढल्या काळात दक्षिणच्या सहा सुभ्यांखेरीज उत्तरेतील गुजराथ, माळवा, पंजाब, बंगाल, बुंदेलखंड, आग्रा, दिल्ली, दुआब, अयोध्या, ओरिसा या प्रदेशांच्या चौथाईच्या सनदा मराठ्यांनी काही खुषीने, काही जबरदस्तीने मिळविल्या. आणि यामुळेच सर्व हिंदुस्थानभर मराठयांचा संचार होऊ लागला व मुस्लिम सत्ता नष्ट झाली.

'''मुलूखगिरी'''
{{gap}}पण यामुळे मराठी राज्य हे राज्य असे राहिलेच नाही. प्रदेश तोडून दिल्यामुळे आणि प्रत्येक सरदाराने स्वतंत्र फौज ठेवावयाची असल्यामुळे ते ते प्रदेश म्हणजे स्वतंत्र राज्येच झाली. आणि हे सरंजाम वंशपरंपरेने दिल्यामुळे सर्व राज्य कायमचे विघटित झाले. शिवाय दर पिढीस कर्ता पुरुष निर्माण होतोच असे नाही. त्यामुळे पराक्रम, राज्यविस्तार यासाठी दिलेले सरंजाम, पराक्रम नसतानाही, त्या त्या घराण्याकडे तसेच कायम राहिले. आणि मग स्वाऱ्या मोहिमांसाठी छत्रपती व पेशवे यांना पुरेसा पैसा मिळणे अशक्य होऊन बसले. या पद्धतीने मराठी राज्याचे साम्राज्य झाले हे खरे. पण सत्ता आणि राज्यव्यवस्था या दृष्टीने त्या साम्राज्याला फारच थोडा अर्थ उरला. मराठ्यांच्या मोहिमांना मुलूखगिरी असे कायमचे रूप प्राप्त झाले.

'''दुर्बल छत्रपती'''
{{gap}}सरंजाम तोडून दिल्यामुळे मराठी राज्य विघटित झाले. आणि मराठी राज्यातील आणखी एका मोठया वैगुण्यामुळे त्या विघटनेला आवर घालणे अशक्य होऊन बसले. ते वैगुण्य म्हणजे मराठा छत्रपतींचे दौर्बल्य, त्यांची कर्तृत्वहीनता! राजारामांसंबंधी मागे सांगितलेच आहे. ते केवळ नाममात्र सत्ताधीश होते. कारभाराची सूत्रे<noinclude></noinclude>
4tiew29xky1kauf2wqxkcexg1irr8u4
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४८
104
73614
230923
164747
2026-06-09T03:14:51Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230923
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५२०}}</noinclude>रामचंद्रपंत अमात्य याच्याकडे होती. तो काही झाले तरी दुय्यम सत्ताधारी, छत्रपती नव्हे. त्यामुळे सर्वावर जरब बसविणे, सर्वांना लगामी लावणे त्याला अशक्य होते. शाहू छत्रपतींच्या कारकीर्दीत हेच झाले. प्रारंभीच्या चारपाच वर्षांच्या काळात त्यांनी बरे कर्तृत्व प्रगट केले, पण ते पुढे टिकले नाही. 'त्याची ही पहिली तरतरी अखेरपर्यंत टिकती तर मराठी राज्याचा पुढील इतिहास पुष्कळसा निराळा झाला असता असे सरदेसायांनी म्हटले आहे (पुण्यश्लोक शाहू, पृ. ४०). ते अगदी खरे आहे. पण ती तरतरी टिकली नाही आणि कारभाराची मुख्य सूत्रे पेशव्यांच्या हाती गेली. म्हणजे जबाबदारी सगळी, पण सत्ता मात्र दुय्यम, अशी स्थिती पुन्हा आली. या दुय्यम सत्तेच्या बळावर पेशव्यांनी कर्तृत्व खूपच गाजविले. त्यामुळेच मराठी स्वराज्याचे साम्राज्य झाले. पण छत्रपतींच्या एकमुखी, निग्रहानुग्रहसमर्थ अशा सत्तेच्या अभावी त्याला वर सांगितल्याप्रमाणे मुखगिरीचे रूप आले.

'''पेशवाईचे रूप'''
{{gap}}पेशवाईचा उदय कसा झाला आणि या कालखंडात मराठी राज्याला कोणते रूप प्राप्त झाले ते आपण पाहत आहो. शाहूराजे दक्षिणेत येऊन छत्रपतीपदी आरूढ झाले, तेव्हा चंद्रसेन जाधव, निंबाळकर, थोरात, घोरपडे इ. अनेक सरदार महाराष्ट्रात प्रबळ होते. ते सर्व संघटित होऊन छत्रपतींना मिळाले असते तर मराठी स्वराज्याला बळकटी येऊन मोगली सत्तेचा त्याच वेळी समूळ उच्छेद झाला असता. पण ते सरदार मोगलांना जाऊन मिळाले. त्यामुळे बाळाजी विश्वनाथ या कर्त्या पुरुषाला शाहू छत्रपतींनी हाताशी घेतले व त्याला पेशवेपद दिले. सुदैवाने तो पुरुष असामान्य कर्तृत्वाचा निघाला. त्याने काही सरदारांना नमवून, काहींना शाहूपक्षाला वळवून महाराष्ट्रात संघटित शक्ती निर्माण केली आणि हुसेन अल्लीच्या गरजेचा फायदा घेऊन दिल्लीहून स्वराज्य, सरदेशमुखी आणि चौथाई या सनदा आणल्या. त्यानंतर शाहूछत्रपतींनी स्वतः राज्यकारभार पाहून स्वाऱ्या, मोहिमा केल्या असत्या तर अल्पकाळातच स्वराज्याला पूर्वीचे रूप प्राप्त झाले असते. पण ते कर्तृत्व, ते तेज त्यांच्या ठायी नव्हते. सर्व भार पेशव्यांवर सोपवून ते सुखासीन झाले. त्यामुळे सत्ता पेशव्यांच्या हाती गेली. पण अनेक सरदारांपैकी एक व अनेक प्रधानांपकी एक अशीच त्यांची पदवी असल्यामुळे, वतनदारीमुळे सुरू झालेल्या विघटनेला आवर घालणे त्यांच्या शक्तीबाहेरचे होते. इतर प्रधान व मंत्री यांना जरब बसविणे त्यांना शक्य नव्हते. वतनदारीला सरंजामदारीचे रूप आले होते तेच मान्य करून त्यांनी राज्याची व्यवस्था केली. यामुळे मराठी राज्यात अनेक, बव्हंशी स्वतंत्र अशी, राज्येच निर्माण झाली. कोणत्याही राज्याच्या बळकटीसाठी अवश्य अशी जी एकमुखी सार्वभौम सत्ता ती मराठी राज्याला कधी लाभलीच नाही. पेशवा हा त्या राज्याचा नेता झाला, पण हे नेतृत्व यशस्वी करण्यास अवश्य ती सत्ता मात्र त्याला कधी मिळाली नाही. त्यामुळे<noinclude></noinclude>
azjmtxb9wvj4ys7ox3nrvt16rw7fifh
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४९
104
73617
230924
164748
2026-06-09T03:15:03Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230924
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५२१|| पेशवाईचा उदय}}</noinclude>मराठमंडळाची सत्ता असे मराठी राज्याला व साम्राज्याला रूप प्राप्त झाले. अर्थात या मंडळाला काही निश्चित घटना होती असे मुळीच नाही. पेशवा आपल्या कर्तबगारीने या विस्कळित प्रपंचातून जी एकसूत्रता व संघटित शक्ती निर्माण करील तेवढेच मराठी राज्याचे सामर्थ्य.
{{gap}}अशा सामर्थ्यावर चालविलेला राज्यकारभार हे पेशवाईचे स्वरूप होते.

{{center|■}}<noinclude></noinclude>
1s6pva0cch1pi2zgpcomw1xagihvl7c
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५०
104
73618
230925
164749
2026-06-09T03:15:29Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230925
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 550
|bSize = 401
|cWidth = 291
|cHeight = 243
|oTop = 42
|oLeft = 59
|Location = center
|Description =

{{rh|'''२७.'''||'''स्वराज्याचे साम्राज्य'''}}

{{gap}}पेशवा बाळाजी विश्वनाथ याने मराठा शक्ती काही प्रमाणात संघटित करून स्वराज्याचे रक्षण केले आणि दिल्लीहून सनदा आणून त्याला बादशाही मान्यता मिळविली; तर त्याचा मुलगा बाजीराव याने या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करून मराठ्यांना हिंदुस्थानच्या इतिहासात वैभवाचे स्थान मिळवून दिले. ते साम्राज्य कसे झाले, त्याच्या मागे प्रेरणा कोणत्या होत्या, त्यातील मराठी सत्ता कशी होती आणि एकंदर त्या साम्राज्याचे स्वरूप काय होते ते संस्कृतीच्या दृष्टीने आता पहावयाचे आहे.

'''चौथाई पद्धती'''
{{gap}}स्वराज्याचा विस्तार झाला तो चौथाईच्या पद्धतीने झाला. चौथाईची पद्धत प्रथम शिवछत्रपतींनी सुरू केली. काही प्रदेशावर त्यांनी आपली सत्ता पूर्णपणे बसविली होती. ते त्यांचे स्वराज्य. त्यानंतर ते वारंवार मोगलांच्या ताब्यातील मुलखावर स्वाऱ्या करीत. त्यामुळे तेथील प्रजाजनांना त्रास होई. तेव्हा त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना व व्यापारी, सावकार इ. प्रमुख नागरिकांना सांगितले की 'या मुलखाच्या उत्पन्नाचा चौथा भाग म्हणजे चौथाई जर तुम्ही आम्हांला दिली तर आम्ही तुम्हांला कसलाही<noinclude></noinclude>
fk9b1ct7ycm5rhfih0kxfo52w7xp6sg
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५१
104
73619
230926
164751
2026-06-09T03:15:42Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230926
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५२३|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>उपद्रव देणार नाही, उलट तुमचे नेहमी संरक्षण करू.' चौथाईची पद्धत ती हीच. स्वराज्याच्या विस्तारासाठी सैन्य ठेवावे लागते, त्याला भारी खर्च येतो. तो खर्च परस्पर शत्रूच्या मुलखातून भागवावयाचा आणि त्या निमित्ताने शिरकाव करून मग तेथे पूर्ण सत्ता स्थापावयाची अशी ही स्वराज्याच्या विस्ताराची अभिनव योजना होती. साम्राज्याच्या विस्तारासाठी मराठ्यांनी याच चौथाईच्या पद्धतीचा अवलंब केला. पुढे इंग्रजांचा पराक्रमी गव्हर्नर वेलस्ली याने तैनाती फौजेचे जे तत्त्व प्रस्थापित केले. ते म्हणजे चौथाईचेच निराळे रूप होते, असे इतिहास पंडित सांगतात.

'''विस्ताराची सनद'''
{{gap}}मोगल बादशहाने, दक्षिणेतले मोगली सत्ता असलेले बऱ्हाणपूर, वऱ्हाड, विजापूर, कर्नाटक, बेदर आणि हैदराबाद हे जे सहा सुभे, त्यांतून चौथाई व सरदेशमुखीचे हक्क वसूल करण्याची सनद मरठ्यांना दिली. तीमुळे साम्राज्यविस्तार करण्यास मराठयांना फार मोठी संधी मिळाली. हा सर्व वसूल मराठ्यांनी स्वतः करावयाचा होता आणि त्याच्या बदल्यात तेथे सतत फौज ठेवून त्या मुलखाचा बंदोबस्त राखावयाचा होता. याचा अर्थ असा की ही सनद म्हणजे राज्यविस्ताराचीच सनद होती. हे जाणून मराठ्यांनी या सहा सुभ्यांत तर संचार सुरू केलाच. पण त्या मर्यादा ओलांडून माळवा, गुजराथ, बुंदेलखंड, या प्रदेशांत फौजा नेल्या आणि प्रथम जबरदस्तीने तेथून चौथाई वसूल करण्यास प्रारंभ केला आणि मागाहून तशा सनदा बादशहाकडून मिळविल्या आणि हेच धोरण पुढे रेटून बंगाल, बिहार, पंजाब, राजस्थान या प्रदेशांतही आपली सत्ता प्रस्थापित केली. अशा रीतीने चौथाई- सरदेशमुखीच्या पद्धतीने मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाला. यांतील माळवा, गुजराथ, बुंदेलखंड येथील बडोदे, उज्जयिनी, इंदूर, ग्वाल्हेर, धम, देवास, सागर अशा काही ठिकाणी पुढे पूर्ण सत्ता स्थापण्यात मरठ्यांना यश आले. पण अन्यत्र तसे यश आले नाही. त्यामुळे मराठयांच्या येथील पराक्रमाला लोकांच्या दृष्टीने हीन रूप प्राप्त झाले. पण तो पुढचा इतिहास आहे. पेशवा बाजीराव यांच्या कारकीर्दीत साम्राज्य विस्तारले कसे ते सध्या आपण पाहत आहो.

'''हिंदू विरुद्ध मुस्लिम'''
{{gap}}बादशाही सनदा मिळाल्या, म्हणून दक्षिणच्या सहा सुभ्यांतील चौथाईची वसुली आणि इतर कारभार सुखाने, सुरळीत होऊ लागला, असे मुळीच नाही. मोगल बादशहा या वेळी स्वतः दुबळा असला तरी त्याचे सुभेदार व सरदार हे मराठ्यांचे अगदी हाडवैरी होते. मोगली सुभ्यांतीलच काय, पण स्वराज्यातलासुद्धा मराठ्यांचा कारभार सुखाने होऊ द्यावयाचा नाही, असा त्यांचा निश्चय होता. या सर्वांत निजाम उल्मुल्क हा मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रू हा महा धूर्त, कारस्थानी व पाताळयंत्री<noinclude></noinclude>
jw6z06h1jwlej0hcaz1l5wgl0rv35r7
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५२
104
73620
230927
164753
2026-06-09T03:15:54Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230927
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महारा संस्कृती||५२४}}</noinclude>होता. मराठ्यांची सत्ता शक्य तर समूळ नाहीशी करावी, आणि दक्षिणेत आपले स्वतंत्र राज्य स्थापावे, अशी त्याची महत्त्वाकांक्षा होती. त्याचे सरदार मुबारिजखान, तुरुकजातखान हेही मराठ्यांचे वैरीच होते. शिवाय दक्षिणेत आर्काटचा नबाब सादतुल्लाखान व त्याच्या विभागातील कडाप्पा, कर्नूळ, शिरे, सावनूर अशा ठाण्यांवरचे नबाब हेही आपापली ठाणी पक्की धरून होते. बादशाही सनदा मानाव्या, असे यांपैकी एकाच्याही मनात नव्हते. उत्तरेत पाहिले तरी तेच. महंमदखान बंगष, सरबुलंदखान, कमरूद्दिनखान या बादशाही सरदारांना मराठ्यांचा होत असलेला उत्कर्ष मुळीच सहन होत नसे. सवाई जयसिंगासारख्या रजपूत सरदारांनी मराठ्यांना अनुकूल असा काही सल्ला बादशहाला दिला तर हे सरदार त्याला कसून विरोध करीत. बुंदेलखंड, गुजराथ, माळवा या प्रत्येक ठिकाणी मोठमोठ्या फौजा घेऊन त्यांनी मराठ्यांना पायबंद घालण्याचा सतत प्रयत्न चालविला होता. यामुळे मराठ्यांना प्रत्येक पाऊल पुढे टाकताना लढाई करावी लागे. आणि ती दरसाल करावी लागे. लढाई केल्यावाचून चौथाई सरदेशमुखीचे हक्क वसूल झाले, असे एका वर्षीही घडले नाही.

'''निष्ठाशून्य'''
{{gap}}पण लष्करी बळावर मराठ्यांच्या मुलखात शिरून या मुस्लिम सुभेदार सरदारांनी जो विध्वंस केला, जो संहार केला त्यापेक्षाही, त्यांनी मोठमोठया मराठा सरदारांना नाना विलोभने दाखवून, भेदनीतीने त्यांना स्वपक्षाला सामील करून घेतले, यामुळे मराठी सत्तेची जास्त हानी झाली. चंद्रसेन जाधव, रंभाजी निंबाळकर, उदाजी चव्हाण यांच्या कथा मागे आल्याच आहेत. त्यांच्या जोडीला आता सेनासाहेब सुभा कान्होजी भोसले, सरलष्कर सुलतानजी निंबाळकर, कंठाजी कदम, उदाजी पवार, चिमणाजी दामोदर राजाज्ञा, त्रिंबकराव दाभाडे सेनापती हे सरदारही निजामाला मिळाले. आश्चर्याची गोष्ट अशी की यातल्या बहुतेकांनी शाहूछत्रपतींच्या बाजूने गुजराथ, माळवा, कर्नाटक या प्रदेशांत आणि स्वराज्यातही मोठमोठे पराक्रम करून साम्राज्यविस्ताराला विपुल साह्य केले होते. पण तरीही त्यांना आपल्या पक्षात ओढण्यात निजाम यशस्वी झाला. कोणत्याही प्रकारच्या निष्ठा त्यांच्या ठायी नव्हत्या हेच त्याचे कारण होय. निजामाला मिळण्यात आपण धर्मद्रोह करीत आहो, आणि महाराष्ट्र राज्याला विरोध करण्यात आपण राष्ट्रद्रोह करीत आहो, असे त्यांच्या मनाला कधी वाटले नाही. स्वामिनिष्ठा ही एक निष्ठा त्या काळी प्रबळ असे; पण तीही त्यांच्या ठायी नव्हती. आज शाहू, उद्या संभाजी, परवा निजाम असा नित्य रुचिपालट ते करीत.

'''कोल्हापूर- संभाजी'''
{{gap}}या सरदारांप्रमाणेच कोल्हापूरचे संभाजी राजे हा साम्राज्यविस्ताराच्या मार्गातला फार मोठा अडसर होता. महाराणी ताराबाई यांच्याप्रमाणेच, मराठी राज्याचे खरे<noinclude></noinclude>
1zrzhcmc7g0etf3dc99e42s32o15l8b
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५३
104
73621
230928
164754
2026-06-09T03:16:08Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230928
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५२५|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>धनी आपणच, अशी त्यांची भावना होती. वास्तविक, शाहुछत्रपतींनी या बाबतीत त्यांच्याशी शक्य ती तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. तुम्ही पराक्रम करा, पराक्रमी माणसे हाताशी घ्या, मोगली प्रदेश जिंकून घ्या, आम्ही तसाच उद्योग करू आणि आमच्यातला निम्मा वाटा तुम्हांला देऊ, तुमच्यातला निम्मा वाटा आम्हांला द्या, असे छत्रपतींनी संभाजी राजांना अनेक वेळा विनविले होते. पण त्यांच्या ठायी ती कर्तबगारी नव्हती. दाभाडे, कदम, उदाजी चव्हाण असे अनेक सरदार शाहूचे राज्य बुडवून संभाजी राजांना गादीवर आणण्याची भाषा बोलत. पण त्यासाठी ते निजामाचा आश्रय करीत. वास्तविक याची काय गरज होती ? एवढे सरदार संघटित झाले असते तर त्यांच्या साह्याने निजामाला आणि कर्नाटकातील नबाबांना सहज रगडून काढता आले असते. आणि मराठयांचे स्वतंत्र राज्यच स्थापिता आले असते. पण संभाजीराजांना किंवा त्या सरदारांना तसली काही आकांक्षाच नव्हती. म्हणून त्या त्या वेळेच्या लहरीप्रमाणे ते एका पक्षाच्या बाजूने दुसऱ्याच्या मुलखात धुमाकूळ माजवीत आणि लूटमार करून पैसा जमवीत. यामुळे यातील बहुतेक सरदारांचे कर्तृत्व, त्यांची गुणसंपदा वाया गेली, आणि त्यांची बंडखोरी शमविण्यात शाहूछत्रपती आणि पेशवे यांची निम्मी शक्ती वाया गेली.

'''कर्तृत्वशून्य प्रधान'''
{{gap}}भारतभर भिन्नभिन्न प्रदेशांत सत्ताधारी असलेले मुस्लिम सुभेदार, सरदार, नबाब ही मराठी साम्राज्यविरोधी अशी पहिली शक्ती. या सरदारांना फितूर होऊन शाहू- छत्रपतींना बुडविण्यास सज्ज होणारे मराठा सरदार ही दुसरी शक्ती. तिसरीही अशीच एक शक्ती होती. ती म्हणजे शाहू छत्रपतींचे प्रतिनिधी, अमात्य, सुमंत, मंत्री, सेनापती इ. पेशव्याला पाण्यात पाहणारे प्रधान. हे सर्व पिढीजाद लोक होते आणि त्यांच्या मते, पेशवा म्हणजे कानामागून आलेला एकोणीस वीस वर्षांचा पोरगा ! त्याला हे सर्वात महत्त्वाचे पद दिले, याचे त्यांना वैषम्य वाटत असे. ते त्याच्या मत्सराने जळत असत. असा मत्सर वाटणे हे अगदी स्वाभाविक आहे. पण एक तर छत्रपतींनी एकदा नेमणूक केल्यानंतर राज्याची शिस्त म्हणून सर्व प्रधानांनी व सरदारांनी मान देणे अवश्य होते. पण शिस्त ही कल्पनाच मराठा सरदारांना मान्य नव्हती. एकदा आज्ञा झाल्यानंतर स्वार्थ, मानापमान, मत्सर सर्व बाजूस ठेवून, सर्वांनी आज्ञेप्रमाणे एकजुटीने कार्य केले पाहिजे, हा जो कोणतीही संस्था चालण्यास अवश्य असलेला गुण तो मराठ्यांच्या अंगी कधी बाणलाच नाही. त्यामुळे पेशव्याविरुद्ध या प्रधानांनी कायम आघाडी उघडलेली होती.

'''पेशव्यांचा मत्सर'''
{{gap}}पण पेशव्याशी दावा धरूनही या प्रधानांना मराठी सत्तेच्या विकासाला साह्य<noinclude></noinclude>
743n1c4zd32m7n7j9ezhn74q0xdtvrb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५४
104
73622
230929
164755
2026-06-09T03:22:55Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230929
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५२६}}</noinclude>करता आले असते. शाहू महाराजांनी प्रत्येकाला मुलुखगिरीसाठी स्वतंत्र प्रदेश वाटून दिला होता. आणि यवनाक्रांत सर्व हिंदुस्थान त्यांना पराक्रमासाठी मोकळा होता. आपल्या हिंमतीवर सेना उभारून त्यांनी या प्रदेशात मराठी सत्ता विस्तारली असती तर छत्रपतींनी त्यांचे कौतुकच केले असते. १७२५ च्या दसऱ्यानंतर त्यांनी या सरदारांना कर्नाटकची मोहीम स्वतंत्रपणे करण्यास आज्ञाच दिली होती. या वेळी फत्तेसिंग भोसले यास प्रमुख नेमून श्रीपतराव प्रतिनिधी, खंडेराव दाभाडे, सुलतानजी निंबाळकर, सरलष्कर यांना त्याच्या हाताखाली सामील होण्याचे हुकुम सोडले होते. पेशवा बाजीराव यास त्यांनी मुद्दामच त्यातून वगळले होते. त्यांना स्वतंत्रपणे मोहीम करण्यास अवसर द्यावा, हा त्यांचा हेतू होता. पण बाजीरावावाचून हे सरदार पुढे पाऊल टाकण्यास तयारच होईनात. तेव्हा नाइलाजाने छत्रपतींना त्याला पाठवावे लागले. ही या प्रधानांची हिंमत, हे यांचे कर्तृत्व! पुढच्या वर्षीच्या कर्नाटकच्या दुसऱ्या म्हणजे श्रीरंगपट्टणच्या स्वारीत तर ते आणखीन उघडे पडले. बाजीराव स्वारीवर असताना निजामाने संभाजी राजांना उठवून शाहू महाराजांना उखडून टाकण्याचा डाव मांडला होता. त्या वेळी स्वसंरक्षणासाठी महाराजांना बाजीरावालाच परत बोलवावे लागले. ती कामगिरीसुद्धा करण्याची ताकद इतर कोणात नव्हती आणि असे असूनही या प्रधानांचा मत्सर, द्वेष कायम होता. आणि संभाजी राजांचे नाव पुढे करून निजामाला मिळणे हे उद्योग चालूच होते. आनंदराव सुमंताने तर निजामास चिथावणी दिली की बाजीरावाशी वैर धरल्यास शाहूमहाराजांना वाईट वाटणार नाही, राज्यातील कुत्रेही त्यास (बाजीरावास) सामील होणार नाही ! प्रतिनिधी, नारोराम मंत्री, अमात्य सर्वांची हीच तऱ्हा स्वतःच्या ठायी कर्तृत्व नाही आणि बाजीरावाचा उभा द्वेष ! आणि त्यापायी त्याच्या मार्गात कांटे पसरणे आणि छत्रपतींचे मन त्याच्याविषयी कलुषित करणे हा उद्योग !

'''थोरले बाजीराव'''
{{gap}}अशा या परिस्थितीतून, दारचे आणि घरचे शत्रू यांचा विरोध मोडून काढून श्रीमंत बाजीराव बल्लाळ पेशवे ऊर्फ राऊस्वामी यांनी मराठी स्वराज्याचे साम्राज्य कसे केले ते आता पहावयाचे आहे. हिंदुपदपातशाहीवरील अढळ दृष्टी, अविचल स्वामिनिष्ठा, निःस्वार्थ, निकोप वृत्ती, असामान्य युद्धनेतृत्व, अखंड सावधानता आणि नवे कर्तृत्व निर्माण करण्याची विद्या या बळावरच त्यांनी हे प्रचंड कार्य साधले, यात शंका नाही.
{{gap}}शाहू छत्रपती स्थिरपद झाले आणि चौथाई सरदेशमुखीच्या सनदा त्यांना मिळाल्या. त्यामुळे हिंदुपदपातशाहीच्या कार्यास नव्या उत्साहाने, नव्या जोमाने त्यांनी प्रारंभ केला. प्रथम त्यांनी कर्नाटककडे दृष्टी वळविली. त्या वेळी तुंगभद्रेच्या दक्षिणेच्या सर्वच प्रदेशाला कर्नाटक म्हणत असत. त्या प्रदेशातून चौथाईचे हक्क वसूल करण्यासाठी त्यांनी फत्तेसिंग भोसले यास आज्ञा दिली.
<noinclude></noinclude>
gguwi14xgs571uf4oxls0nmt6udyiqy
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५५
104
73633
230930
164773
2026-06-09T03:23:20Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230930
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५२७|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>
'''कर्नाटक मोहिमा'''
{{gap}}वर सांगितलेच आहे की निजाम हा मराठ्यांचा सर्वांत मोठा शत्रू होता. स्वतःच्या हैदराबाद सुभ्यात तर त्याने सुखाने कधी वसूल होऊ दिला नाहीच, पण कोणत्याच सुभ्यात असा वसूल होऊ द्यावयाचा नाही, असा त्याचा निर्धार होता. त्यामुळे कर्नाटकात तर त्याने अडसर उभे केलेच. गुजराथ, माळवा, बुंदेलखंड या प्रदेशांतही तो मराठ्यांच्या विरुद्ध कारस्थाने रचीत असे. कर्नाटकात मराठे जातात असे पाहाताच, त्याने तेथील सर्व मुस्लिम सरदार- नबाबांना पत्रे लिहून चिथावणी दिली व स्वतःही लष्कर घेऊन तेथे उतरला. यामुळे या संग्रामाला साहजिकच हिंदू विरुद्ध मुसलमान असे रूप आले. कर्नाटकात तंजावरला व्यंकोजीच्या वंशजांचे राज्य आधीपासूनच होते. संताजी घोरपडे याचे पुत्र पिराजी व मुरारराव घोरपडे यांनी गुत्तीला मराठ्यांचे बळकट ठाणे निर्माण केले होते. शिवाय श्रीरंगपट्टणचा वोडियार, साेंध्याचा राजा बस्वलिंग यांनीही मुसलमानी उपद्रवापासून आम्हांस सोडवावे अशी छत्रपतींची विनवणी केली होती. हे सर्व ध्यानी घेऊनच शाहू महाराजांनी फत्तेसिंग भोसले, दाभाडे, निंबाळकर, प्रतिनिधी यांना तिकडे पाठविण्याचा विचार केला होता. निरनिराळ्या सरदारांना निरनिराळे प्रदेश वाटून देऊन त्यांच्या कर्तृत्वास अवसर द्यावा असा त्यांचा यात हेतू होता. पण दुर्दैवाने त्यांनी कच खाल्ली. आणि पेशवा बाजीराव यालाही तिकडे जावे लागले. लागोपाठ चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टण या दोन स्वाऱ्या करून त्याने त्या प्रांतांत मराठ्यांची पत पुष्कळच वाढवली. मुस्लिम अधिसत्ता सोडून कर्नाटकीय संस्थानिक मराठ्यांच्या अधिसत्तेखाली येण्यास खुषीने तयार झाले, यातच पेशव्यांचे यश सामावलेले आहे.

'''निजाम- शाहू'''
{{gap}}पण पेशवा बाजीराव आणि इतर मराठे सरदार कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतलेले पाहून निजामाने इकडे भलताच उपद्व्याप सुरू केला. कोल्हापूरच्या संभाजीराजांना त्याने चिथावले आणि चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, रंभाजी व जानोजी निंबाळकर यांना शाहूमहाराजांच्या विरुद्ध उठवून त्यांच्या राज्यावर चहूबाजूंनी चढाईच सुरू केली. मात्र शाहूराजांना त्याने मानभावीपणाने पत्र लिहिले की तुमचा आमचा तंटा नाही. पण तुमचा पेशवा बाजीराव हा कारण नसता आमच्या मुलखाला त्रास देतो. तेव्हा त्याला दूर करा. मग तुमचा आमचा स्नेह कायमचा आहे. शाहूमहाराजांना प्रथम हे खरं वाटे. बाजीराव नसते उद्योग करीत आहे, असा त्यांचा समज झाला. पण निजामाने प्रत्यक्ष चढाईच सुरू केली, तेव्हा त्यांचे डोळे उघडले. शिवाय निजामाने त्यांना असेही लिहिले की संभाजीराजेही तुमच्याप्रमाणेच मराठी राज्यावर हक्क सांगत आहेत. तेव्हा तुम्ही आपसात लढून काय तो निकाल लावा म्हणजे<noinclude></noinclude>
lj5cagqbhos70uzt7dgbtb4d3kznjpa
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५६
104
73634
230931
164774
2026-06-09T03:23:38Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230931
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५२८}}</noinclude>चौथाई देण्यास आम्ही तयार आहो. बहादुरशहाने ताराबाईच्या बाबतीत शाहूराजांना हेच सांगितले होते. तोच डाव निजामाने पुन्हा टाकलेला पाहून महाराज संतापले आणि त्यांनी लगोलग पेशवा बाजीराज यास कर्नाटकातून परत बोलाविले.

'''पालखेड'''
{{gap}}आणि मग १७२७ च्या दसऱ्यापासून १७२८ च्या फेब्रुवारीपर्यंत बाजीराव आणि निजाम यांची प्रचंड लढाई झाली. दोघांनी एकमेकांच्या प्रदेशात प्रचंड विध्वंस व संहार केला. पण शेवटी बाजीरावाने १७२८ च्या फेब्रुवारीत पालखेडजवळ निजामाचा पुरा कोंडमारा केला, तेव्हा त्याची रग जिरली व शरण येऊन त्याने, संभाजीस शाहू महाराजांच्या स्वाधीन करावे आणि दक्षिणेच्या सहा सुभ्यांवर मराठयांचे हक्क सुरळीत चालू द्यावे, या अटी मान्य केल्या. मराठयांच्या इतिहासात ही लढाई फार प्रसिद्ध आहे. कारण त्या लढाईने मराठ्यांचा सर्वात मोठा शत्रु नामोहरम झाला, बाजीराव पेशव्याचा पराक्रम जगाला दिसून आला, शिंदे, होळकर, पवार इ. त्याच्या सरदारांची कर्तबगारी लोकांच्या प्रत्ययास आली आणि मराठी साम्राज्याचे भवितव्य ठरले. अत्यंत विस्कळित, विघटित, फुटीर अशा मराठा समाजातून मोठमोठ्या शत्रुवरही मात करणारी सांघिक शक्ती निर्माण करणारा एक नवा पुरुष उदयास आला आहे याची समज त्या दिवशी सर्व हिंदुस्थानला मिळाली.

'''माळवा'''
{{gap}}माळवा आणि बुंदेलखंड हे प्रदेश चिमाजी बाजीरावांनी जिंकले, तेव्हा या नव्या सामर्थ्याचा सर्वांना पुन्हा एकदा प्रत्यय आला. पालखेडची लढाई निजाविरुद्ध होती. तर अमझेरा आणि जैतपूर येथील लढाई दिल्लीच्या मोगल बादशहाचे मोठे पराक्रमी सरदार यांच्या विरुद्ध होती. त्यामुळे माळव्यातील विजय सर्व हिंदुस्थानात फार दुमदुमला. या लढायांची वर्णने येथे देण्याचा विचार नाही. त्याचे कारणही नाही. त्या वेळच्या राजकीय पटावरील भिन्न भिन्न शक्ती कोणत्या होत्या, त्यांच्यामागे प्रेरणा कोणत्या होत्या, मराठ्यांच्या मार्गात अडसर कोणते होते, नवे कर्तृत्व कोणते उदयास आले, हे सर्व पाहून यशापयशाची मीमांसा आपल्याला करावयाची आहे.
{{gap}}महाराष्ट्रात स्वातंत्र्ययुद्ध चालू होते, तेव्हा मराठे सरदार मधूनच नर्मदा पार होऊन गुजराथ, माळवा, बुंदेलखंड या प्रदेशात मुसंडी मारीत असत. या सर्व प्रांतांतून आपल्याला चौथाई वसूल करावयाची आहे, हा विचार त्यांच्या मनात तेव्हापासून पक्का रुजलेला होता. शाहू छत्रपतींची सत्ता स्थापन झाल्यावर त्यांनी वरील प्रदेशात आपले सरदार पाठविण्यास योजनापूर्वकच प्रारंभ केला.
<noinclude></noinclude>
ewyp487241tixufrr3uxwlgarmf4zr7
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५७
104
73635
230932
164775
2026-06-09T03:24:13Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230932
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५२९|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>
'''हिंदू नेता'''
{{gap}}अर्थात मोगल पातशहा आणि त्याचे सरबुलंदखान, महंमदखान बंगष इ. सरदार यांचा या मराठा आक्रमणास सक्त विरोध होता, हे उघडच आहे. त्यांच्याप्रमाणेच निजामाचाही विरोध होता. त्याची स्वतःची आकांक्षा दक्षिणेपुरतीच होती हे खरे. पण मराठे प्रबळ झाले तर पुढे आपल्याला भारी पडतील हे त्याला दिसत होते. म्हणून शक्य तेथे तो त्यांच्याविरुद्ध कारस्थाने करीत असे. पण या वेळी माळव्यात रजपूत सरदार आणि लोक मराठ्यांना अनुकूल होते. सवाई जयसिंग हा तर मराठ्यांना पूर्ण अनुकूल होता. आणि त्यानेच बाजीरावास बोलावून घेऊन ही स्वारी करविली, असे काही पंडितांचे मत आहे. मंडलोई, अनूपसिंग या सरदारांनी तर बाजी- चिमाजीस प्रत्यक्ष साह्यच केलं. कारण मोगली अंमल लोकांना असह्य झाला होता. गिरिधर बहाद्दूर व दया बहाद्दूर या दोन बादशाही अंमलदारांनी प्रजेला अगदी पिळून काढले होते. त्यामुळे सरदारांप्रमाणेच प्रजाजनांनीही मराठ्यांचे स्वागतच केले. याच कारणाने नानासाहेब सरदेसाई यांनी या युद्धाला रजपूत व मराठे यांचे मोगलांविरुद्ध धर्मयुद्ध असे म्हटले आहे. यावरून कर्नाटकातील युद्धाप्रमाणेच हे माळव्यातील युद्धही हिंदुपदपादशाहीच्या स्थापनेसाठीच होते, हे स्पष्ट दिसते. पेशवा बाजीराव याचा, शिवछत्रपतींच्या नंतरचा हिंदूंचा मोठा पुरस्कर्ता, असा गौरव सर्वत्र झाला, तो याच कारणाने.
{{gap}}माळवा बुंदेलखंड या स्वारीत उदाजी पवाराचे फार मोठे साह्य झाले. बाजीरावाच्या आज्ञेवरून तो १७२२ पासून माळव्यात संचार करीत होता. १७२४ साली त्याने धारला आपले ठाणेही वसविले. आणि तेथून तो गुजराथ, काठेवाड, मारवाड, बुंदी, कोटा, बुंदेलखंड एवढ्या टापूत संचार करीत असे.

'''अद्भुत पराक्रम'''
{{gap}}कंठाजी कदम हा माळव्यात उपद्रव करीत होता. त्याच्यावर गिरिधर बहादूर हा मोगल सुभेदार चालून गेला तेव्हा तो पळून गेला. तेव्हा बहादुराने अमझेरा येथे मुक्काम केला. येवढ्यात चिमाजी आप्पा आणि उदाजी पवार २२ हजार फौजेनिशी त्यावर चालून गेले. २२ नोव्हेंबर १७२८ रोजी मोठी लढाई होऊन गिरिधर व दया- बहादूर ठार झाले. मराठ्यांची फत्ते झाली. आणि क्षणभर सर्व हिंदुस्थान हादरले. मराठ्यांचा हा पराक्रम अद्भुत असाच होता.
{{gap}}याच वेळी बुंदेलखंडावर झडप घालून बाजीरावाने महंमदखान बंगष या दुसऱ्या बादशाही सरदारास खटा केले. बुंदेले हे रजपूतच होते. त्यांचा राजा छत्रसाल हा पराक्रमी होता. तो शिवछत्रपतींना भेटल्याचे मागे सांगितलेच आहे. पण त्यानंतर बुंदेल्यांनी विशेष पराक्रम केला नव्हता. ही एक मोठी खेदाची गोष्ट आहे की राजस्थानातील<noinclude>
{{gap}}३४</noinclude>
t0vranpeasy28tne2xaz6cp2tct2uwu
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५८
104
73636
230933
164776
2026-06-09T03:24:26Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230933
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५३०}}</noinclude>किंवा बुंदेलखंडातील रजपूत यांनी मराठ्यांच्यासारखी संघशक्ती कधी निर्माण केली नाही आणि मोगल पातशाहीविरुद्ध स्वतःच्या बळावर कधी उठाव केला नाही. पण बाजीरावाच्या पराक्रमाच्या वार्ता ऐकून त्यांना आता जोम आला, उत्साह आला आणि ते मराठ्यांना सामील होऊन बादशाही बुडवू लागले. तेव्हा महमंद खान बंगष त्यावर चालून आला आणि जैतपूरच्या लढाईत त्याने छत्रसालाचा पराभव केला. याच वेळी चिमाजी आप्पाच्या विजयाच्या वार्ता छत्रसालाच्या कानावर आल्या व त्याने आपला वकील दुर्गादास यास बाजीरावाकडे पाठवून मदतीची याचना केली. बाजीराव तिकडे निघालाच होता. त्याला आता अधिकच जोर चढला. त्याने त्वरेने येऊन बंगषाला वेढा घातला आणि अन्नपाणी काटून त्याचे नरडे आवळले. १७२९ च्या मे महिन्यात ही लढाई झाली. बंगषाच्या मदतीला बादशाही सरदार आले होते. पण वाटेतच मराठ्यांनी त्यांना धुळीस मिळविले. त्यामुळे बंगषाला शरणागती पत्करण्यावाचून गत्यंतरच राहिले नाही.

'''नवे कर्तृत्व'''
{{gap}}असे हे दोन फार प्रचंड व निर्णायक विजय मिळवून बाजी- चिमाजी परत आले. पालखेडच्या व या स्वारीत राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, पिलाजी जाधव, उदाजी पवार हे प्रमुख आणि बाजी भीवराव रेठरेकर, गणतपराव मेहेंदळे, अंताजी माणकेश्वर, नारो शंकर, गोविंद बल्लाळ खेर, तुकोजी पवार, दावलजी सोमवंशी, असे अनेक नवे कर्ते पुरुष उदयास आले. त्यांच्या कर्तृत्वावरच पुढचा साम्राज्यविस्तार झालेला आहे.

'''मराठ्यांची वृत्ती'''
{{gap}}माळवा, बुंदेलखंड यांवरील अपूर्व विजयामुळे मराठी सत्तेची हद्द यमुनेला जाऊन मिळाली त्यामुळे समस्त यावनी मंडळास मोठी दहशत बसली. बादशहास तर वाटू लागले की बाजीराव आता दिल्लीवर येतो. आणि पुढे सात आठ वर्षांनी हा पेशवा दिल्लीवर चालून गेलाच होता; त्यावरून ही भीती निराधार होती असे नाही. मराठ्यांच्या एका वकिलाने त्या वेळी लिहिलेच की 'रायांचा पुण्यप्रताप ऐसा जाला आहे की हस्तानापूरचे राज्य घेऊन छत्रपतीस देतील तर आज अनुकूल आहे.' बादशहाप्रमाणेच निजामही धसकून गेला. बादशहाबद्दल त्याला मुळीच निष्ठा नव्हती. पण दिल्लीला मोगल, मुस्लिम पातशाही राहिली पाहिजे आणि हिंदूंचा सर्वत्र पाडाव झाला पाहिजे अशी त्याची प्रबळ आकांक्षा होती. आणि दिल्ली पडली तर आपले राज्यही जाईल ही भीती त्याला होतीच. बादशहा आणि निजाम याप्रमाणे हादरले आणि संतप्त झाले तर ते स्वाभाविक होते. पण बाजीरावाच्या या पराक्रमामुळे संभाजी राजे व सेनापती दाभाडे हेही संतापून उठले ही दुर्दैवाची गोष्ट होय. पण मराठ्यांची<noinclude></noinclude>
jn1b2uy5g06gw4hnmo3l9qgyf48fdug
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५९
104
73637
230934
164777
2026-06-09T03:24:39Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230934
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५३१|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>फुटीर वृत्ती, बेशिस्त वर्तन आणि निखालस निष्ठाशून्यता ही लक्षात घेता, मुस्लिम सत्ताधीश माळव्यामुळे संतापणे जितके स्वाभाविक होते, तितकेच मराठे सरदार संतापणे हेही स्वाभाविकच होते असे म्हणावेसे वाटते.

'''निजामाची विश्रांती'''
{{gap}}मराठयांच्या या वृत्तीचा फायदा घेण्यास निजाम सदैव टपलेलाच होता. मराठ्यांच्यात जेथे फूट दिसेल तेथे पाचर मारून, भेदनीतीचा अवलंब करून, त्यांचे सामर्थ्य खच्ची करण्याचे निजामाने व्रतच घेतले होते. आणि पुढील निजामांनी मराठ्यांच्या सत्तेच्या अखेरीपर्यंत ते काम चालवले होते. निजाम नसता, किंवा वेळीच व्यंकोजीराम या वकिलाने म्हटल्याप्रमाणे, 'निजामाची बाजीरावांनी विश्रांती केली असती', तर मराठी साम्राज्याचा विस्तार झाला यापेक्षा कितीतरी जास्त झाला असता...पण तसे झाले नाही. असो. पालखेडला पूर्ण पराभव झाल्यामुळे या वेळी निजामाला उघडपणे लष्करी हालचाल करणे जरा धोक्याचे वाटले. म्हणून त्याने संभाजी राजे व सेनापती दाभाडे यांना शाहू छत्रपतींच्या विरुद्ध उठविले आणि त्यांचे राज्य समूळ नष्ट करण्याचा डाव टाकला.

'''वारणेचा तह'''
{{gap}}संभाजीराजांचा या वेळी उदाजी चव्हाण हा मुख्य साह्यकर्ता होता. निजामाच्या पाठिंब्याने आणि चव्हाणाच्या बळावर त्यांनी शाहू छत्रपतींवर स्वारी करण्याचेच ठरविले. मग मात्र संभाजीराजांचा पक्का बंदोबस्त करण्याचे छत्रपतींनी ठरविले आणि स्वारीची तयारी केली. या वेळी त्यांनी प्रतिनिधीस ही कामगिरी सांगितली आणि शंभुसिंग जाधव - चंद्रसेनाचा मुलगा- याला त्याच्या हाताखाली दिले. ही स्वारी पन्हाळे भागावर झाली. प्रतिनिधीने या वेळी यश चांगले मिळविले. संभाजी व उदाजी यांचे सर्व लष्कर लुटून फस्त केले; हजारो लोक पाडाव केले आणि ताराबाई, राजसबाई, संभाजीराजांच्या स्त्रिया, भगवंतराव अमात्य आणि व्यंकटराव घोरपडे यांना कैद केले. इतके झाल्यावर संभाजीराजांना शरण येणे भागच पडले. त्याप्रमाणे ते शरण आल्यावर छत्रपती व राजे यांच्यात तह ठरला. तो वारणेचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. वारणेचा मुलूख छत्रपतींनी राजांना दिला व पुन्हा मराठी राज्यात हस्तक्षेप करणार नाही असा करार त्यांच्याकडून लिहून घेतला.

'''अस्तनीतील निखारे'''
{{gap}}छत्रपतींच्या स्वभावातील एक वैगुण्य येथे ध्यानात घेतले पाहिजे. ते स्वभावाने फार मृदू होते, कनवाळू होते. बंडखोर, अपराधी, स्वामिद्रोही यांना त्यांनी कठोर अशी शिक्षा कधी केलीच नाही. त्यामुळे त्या त्या विरोधी शक्ती अस्तनीतील निखाऱ्या-<noinclude></noinclude>
2qunbxmjnru4103g9q0tttk0rhwvp1o
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६०
104
73638
230935
164778
2026-06-09T03:25:41Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230935
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५३२}}</noinclude>प्रमाणे कायम राहिल्या. कोल्हापूरला संभाजीराजांच्या बाबतीत हेच झाले. तहा- अन्वये त्यांना स्वतंत्र राज्य दिलेले नव्हते. ती एक जहागीर होती. पण हळूहळू कोल्हापूरला स्वतंत्र सवत्या सुभ्याचे रूप आले आणि मराठी राज्याची शक्ती कायमची द्विधा होऊन बसली.

'''सेनापतीची दुर्बुद्धी'''
{{gap}}दाभाड्यांच्या बाबतीत असेच घडले. खंडेराव दाभाडे हा मोठा पराक्रमी पुरुष. त्याचा पराक्रम पाहून शाहूछत्रपतींनी त्याला १७१७ साली सेनापती नेमले आणि गुजरात प्रांत त्याच्याकडे दिला. तेथे प्रथम त्याने व पुढे तो आजारी झाल्यावर त्याचा सरदार पिलाजी गायकवाड आणि त्याचा मुलगा त्रिंबकराव यांनी चांगली कामगिरी केली. पण १७२० नंतर बाजीरावाचा झपाट्याने उत्कर्ष होऊ लागला. त्याच्या पराक्रमामुळे शाहू छत्रपती त्याला फार मान देऊ लागले. यामुळे सर्व प्रधानांना व सेनापतीलाही त्याचा मत्सर वाटू लागला. याविषयी मागे लिहिलेच आहे. बाजीराव हा कालचा वीस वर्षांचा पोर. आपल्याहून श्रेष्ठपदी जातो याचा मत्सर वाटणे साहजिक होते. पण त्यापेक्षा आपण जास्त पराक्रम करून दाखविणे हा त्यावर उपाय होता. शाहूछत्रपती तसा अवसर प्रत्येकाला देत होते. कर्नाटकच्या स्वारीत त्रिंबकराव होताच. तरी बाजीरावावाचून स्वारी पुढे जाईना. असे झाले तरी बाजीरावाशी या मोठया सरदारांनी वैर धरावे, हे मराठ्यांचे दुर्दैव होय.
{{gap}}गुजराथ प्रांत त्यांना नेमून दिलेला असताना दाभाडे व गायकवाड मावळ, कल्याण, भिवंडी या भागात व माळव्यात म्हणजे पेशव्याच्या मुलखात घुसून लुटालूट करीत, खानदेश, बागलाण या मुलखातही घुसत. छत्रपतींनी त्यांची अनेक वेळा कानउघाडणी केली. पण त्याचा कधीच काही उपयोग झाला नाही. त्यांनी बाजीरावांशी कायम तेढ धरली. बाजीरावाची या बाबतीतली भूमिका निराळी होती. छत्रपतींनी सर्व भरीभार त्याच्यावर टाकला होता. त्यामुळे कोणा सरदाराला प्रांत वाटून दिला तरी त्या प्रांताशी पेशव्याचा संबंध कायम राहावा असे त्याचे मत होते. आणि राज्याच्या एकसूत्रतेच्या दृष्टीने ते योग्यच होते. या दृष्टीने सेनापती दाभाडे यास पेशव्याने सांगितले की माळवा भागाचा निम्मा वसूल आम्ही तुम्हांला देतो, गुजराथचा निम्मा तुम्ही आम्हांला द्यावा. पण निंबाळकर दाभाडे याला ते मान्य झाले नाही. पेशव्याच्या मुलखात लूटमार करण्याचे त्याने थांबविले नाही. त्यामुळे पेशव्याने गुजराथेतही उदाजी पवार व पिलाजी जाधव यांना चौथाईच्या वसुलीसाठी पाठविले.
{{gap}}यातूनच सेनापती दाभाडे व पेशवा बाजीराव यांची दुभईची लढाई उद्भवली. निजाम वरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होता. दाभाडे व पेशवा यांच्यातील तेढ तीव्र झालेली पाहताच त्याने पाऊल उचलले आणि गुजराथकडून दाभाडे व खान-<noinclude></noinclude>
mk3xcwq3qi3dm7xy5hjibzxxdhqv14w
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६१
104
73639
230936
164779
2026-06-09T03:25:55Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230936
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५३३|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>देश बागलाण या बाजूने निजाम यांनी उठावणी करून एकमेकांस मिळावयाचे अशी मोहीम त्यांनी आखली. त्रिंबकराव दाभाडे यांनी जाहीर केले की 'आमचे धनी छत्रपती, त्यांचे राज्य बाजीरावाने घेतले ते त्यांचे त्यांस परत द्यावयास जातो.' या वेळी पिलाजी गायकवाड, कंठाजी कदम, रघूजी कदमबांडे आणि उदाजी व आनंदराव पवार (हे बाजीरावाचे सरदार आता फितूर झाले) असे त्याच्या बरोबर होते.
{{gap}}या संबंधात चिमाजी आप्पाने लिहिले आहे की 'दाभाड्यांनी कज्जा केला तर तो आम्ही संभाळतो. पण ते जर निजामास जाऊन भेटले तर त्यांचा हुद्दा परिच्छिन्न दूर करावा. एवढी गोष्ट महाराजांपाशी पक्की ठरवून मग दाभाड्यांना गुजराथच्या सनदा द्याव्या.'
{{gap}}यावरून पेशवे आणि इतर सरदार यांच्या वृत्तीतला फरक स्पष्ट होईल.
{{gap}}दाभाड्यांनी स्वारीच काढली, तेव्हा पेशव्यांनीही तयारी केली. सेनापतींची समजूत घालून त्यांना साताऱ्यास घेऊन यावे, असे शाहू महाराजांनी बाजीरावास सांगितले होते. त्याप्रमाणे स्वारीस निघाल्यापासून बाजीरावाने जासूदातर्फे प्रयत्न चालविले होते. पण त्रिंबकरावाला ते नकोच होते. त्यामुळे लढाई अटळ झाली. निजामाची व दाभाड्याची मिळणी होण्यापूर्वीच बाजीरावाने डभई येथे दाभाड्यांना गाठले. लढाई मोठी झाली. आणि सेनापती गोळी लागून पडले. लढाई थांबली. बाजीराव एकदम मागे सरला. त्याने लुटालूट होऊ दिली नाही. आणि तो सर्व आवराआवर करून महाराजांना जाऊन भेटला. महाराज म्हणाले, 'अविवेके करून नबाबाशी (निजामाशी) राजकारण केले. दुर्बुद्धी धरून, आगळिक करून, आपणांतच लढाई केली. त्याचे फळ झाले.'
{{gap}}कर्नाटकातील मोहिमा, पालखेड येथे निजामावर मिळविलेला विजय, माळवा आणि बुंदेलखंड या प्रदेशांतील साम्राज्यविस्तार, आणि संभाजीराजे व सेनापती दाभाडे यांनी उभारलेल्या बंडखोरीचा बंदोबस्त या सर्व विजयांचे श्रेय बाजीराव, चिमाजी आणि त्यांचे राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर, इ. जे एकनिष्ठ सरदार यांना आहे. मराठेशाहीला पुढे साठसत्तर वर्षे जे काही यश मिळाले त्याचा पाया यातून घातला गेला.
{{gap}}यानंतरचे दोन मोठे विजय म्हणजे कोकण विजय आणि उत्तर हिंद-विजय होत. त्यांचा क्रमाने विचार करून मग मराठ्यांच्या या साम्राज्यविस्ताराच्या प्रयत्नांची गुणदोष-चिकित्सा करू.

'''कोकण-जंजिरा'''
{{gap}}कोकणात पोर्तुगीज व जंजिरेकर सिद्दी हे मराठ्यांचे कायमचे शत्रू. त्यांना इंग्रजांचे आणि मोगल बादशहाचे कायमचे साह्य असे. हे कोकणचे चित्र शिवाजी महाराजांच्या वेळेपासून आपल्याला दिसत आहे. त्यात या वेळी फारसा फरक झालेला<noinclude></noinclude>
c28f2low2seoqlvkxjf2gifzak8imlu
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६२
104
73640
230937
164780
2026-06-09T03:26:07Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230937
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५३४}}</noinclude>नव्हता. कान्होजी आंग्रे हा मराठ्यांचा मोठा प्रवळ सागरमेनानी होता, म्हणून हे सर्व शत्रू काही काळ दबून होते. तो जाताच मराठ्यांची ही बाजू अगदी लंगडी झाली.
{{gap}}हिंदुधर्माचा नाश करावयाचा आणि हिंदूंचा विध्वंस करावयाचा है मोगलांप्रमाणेच जंजिरेकरांचे कायमचे धोरण होते. कोकणातील परशुराम क्षेत्री ब्रम्हेंद्रस्वामी यांचे कायमचे वास्तव्य असे. छत्रपती शाहू, पेशवे बाळाजी विश्वनाथ व बाजीराव त्याचे अनन्य भक्त होते. काही काळ सिद्दीही त्याचा भक्त होता. पण १७२७ साली काही कारणाने स्वामीशी त्याचे वाकडे आले आणि त्याने शिवरात्रीच्या दिवशी परशुराम क्षेत्राचा पूर्ण विध्वंस केला. तेव्हा ब्रह्मेंद्रस्वामीने शाहू छत्रपतींना सिद्दीचा कायमचा बंदोबस्त करण्यास सांगितले. तेव्हापासून मराठ्यांचे सरदार कोकणात मधून मधून मोहिमा करीत होते. पण संभाजीराजे, निजाम, माळवा ही प्रकरणे हाती होती. त्यामुळे पेशव्यांना तिकडे जाता आले नाही. १७३३ साली ही प्रकरणे मिटल्यावर शाहू छत्रपतींनी जंजिऱ्याची मोहीम आखली आणि पेशवा बाजीराव याची तीवर नेमणूक केली.
{{gap}}कोकणच्या या संग्रामात जंजिरा आणि वसई अशा दोन मोहिमा झाल्या. या दोहींच्या इतिहासावरून पेशवेकालीन मोहिमांची वैशिष्ट्ये स्पष्ट दिसून आली. मोहिमांची कुलमुखत्यारी जेव्हा पेशव्यांच्याकडे असे, तेव्हा ते मोठमोठे विजय मिळवीत. पण प्रतिनिधी, सेनापती, सुमंत किंवा इतर पेशव्यांचा मत्सर करणारे सरदार यांची जेव्हा एकत्र नियुक्ती शाहू छत्रपती करीत, तेव्हा मोहिमेला फारसे यश येत नसे. जंजिऱ्याच्या मोहिमेत असेच झाले. शाहू छत्रपतींनी जंजिऱ्याची मोहीम आखल्यावर दाभाडे, गायकवाड, उदाजी चव्हाण, शंभुमिंग जाधव, सचिव या सर्वांना बाजीरावांची कुमक करण्याविषयी आज्ञापत्रे लिहिली.
{{gap}}प्रतिनिधी कोकणात उतरला; पण त्याने बाजीरावाची भेटही घेतली नाही आणि परस्पर रायगडावर हल्ला करून ते ठाणे हस्तगत केले. पेशव्याला भेटून त्याने हा कार्यक्रम आखावयास हवा होता. पण तो पेशव्याचा द्वेष्टा होता. त्यामुळे मोहीम प्रारंभापासूनच ढिली पडू लागली. पुढे सेखोजी आंगरे याचा सरदार बंकाजी नाईक याने सिद्दी साताचा मोड करून त्याला गोवळकोटपर्यंत मागे रेटीत नेले. आता गोवळकोट पडला असता. पण प्रतिनिधीने लढाईस मना करून वाटाघाटी सुरू केल्या आणि 'आम्ही गनीम सुखे करून घेऊ, भांडायाचे प्रयोजन नाही,' असे नाईकास बजावले. त्यामुळे नाईक परत गेला.
{{gap}}दाभाडे व गायकवाड यांचे व बाजीरावाचे वाकडे असल्यामुळे त्यांनी शाहू छत्रपतींचे हुकूम मानलेच नाहीत ! सेखोजी आंगरे हा बाजीरावाची मिळून होता. पण १७३३ साली मृत्यू पावला. तेव्हा त्याचे बंधू संभाजी व मानाजी यांच्यात वैमनस्य निर्माण झाले. आणि आंगरे घराण्यातच बेबनाव निर्माण झाला. आणि ही कमजोरी पाहून इंग्रज व सिद्दी यांनी आंगऱ्यांचा संपूर्ण नाश करण्याचा डाव टाकला. यामुळे, आणि<noinclude></noinclude>
tstac8fvtqk5yswo129h84azaej8ys7
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६३
104
73641
230938
164781
2026-06-09T03:26:19Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230938
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५३५|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>आरमारी युद्धात स्वतः अनभिज्ञ असल्यामुळे, बाजीराव पेशव्याने जमेल तसा तह केला आणि मोहिमेतून अंग काढून घेऊन तो परत आला.
{{gap}}यानंतर सर्वच मोहीम बारगळावयाची. पण शाहूछत्रपतींनी या वेळी जास्त नेट धरला. प्रथम त्यांनी पिलाजी जाधव यास कोकणात पाठविले. आणि नंतर मानाजी आंगऱ्याच्या आग्रहावरून चिमाजी आप्पा कोकणात उतरला. त्या वेळी रेवस बंदरा- नजीक मोठी लढाई होऊन सिद्दी सात हा 'रावणासारखा दैत्य' मारला गेला. मराठयांना मोठा विजय मिळाला. जंजिरा हस्तगत झाला नाही, अंजनवेल व गोवळकोट हे किल्लेही मिळाले नाहीत. तरी पण दुसरा एक सिद्दी सरदार याकूब हाही वरील लढाईत मारला गेला होता. त्यामुळे सिद्दी रहमान याने पूर्वीचा तह कायम करून युद्ध थांबविले.

'''रचनाच अपायकारक'''
{{gap}}या मोहिमेचे विवेचन करताना नानासाहेबांनी लिहिले आहे, 'मराठमंडळाची शक्ती पाहिजे तितकी असूनही त्याची रचना राज्यवृद्धीस कशी अपायकारक होती याचे विशिष्ट उदाहरण ही जंजिऱ्याची मोहीम होय.' सत्ता महाराजांची, कर्तृत्व बाजीरावाचे. या दोहीचा मेळ बसला नाही की घोटाळे होत. जंजिऱ्याच्या मोहिमेतील अपयशाचे कारण म्हणजे वरील द्विमुखी कारभार होय ! (मराठी रियासत, पेशवा बाजीराव, प्र. २१४, २३३)

'''एकमुखी नेतृत्व'''
{{gap}}या उलट वसईच्या संग्रामाची व्यवस्था होती. त्याची सर्व सूत्रे चिमाजी व बाजीराव यांच्या हाती होती. शिंदे, होळकर, बाजी भीवराव, तुकोजी व भिवाजी पवार इ. सरदार एकदिलाचे होते. म्हणून त्यांना हे अपूर्व यश मिळाले. हे यश अनेक दृष्टींनी अपूर्व असेच होते. मोगलांवर, निजामावर मराठ्यांनी अनेक विजय आतापर्यंत मिळविले होते. पण ते पौर्वात्य लोक. त्यांची युद्धपद्धती जुनी. पोर्तुगीज हे पाश्चात्य. दारूगोळा, शिस्त या सर्वच दृष्टींनी त्यांची पद्धती नवी, त्यांचा कारभार व्यवस्थित, संघटन अगदी दृढ; यामुळे मराठ्यांना त्यावर विजय मिळविता येईल असे कोणालाच वाटले नव्हते. पण तरीही मराठ्यांनी वसई जिंकली म्हणून हा विजय अपूर्व होय.
{{gap}}१७१९ साली स्वराज्याच्या सनदा मिळाल्या आणि लगेच मराठ्यांनी कल्याण व भिवंडी ही ठाणी आपल्या ताब्यात घेतली. आणि तेव्हापासून पोर्तुगीज व मराठे यांचा नव्याने संग्राम सुरू झाला. मराठे सरदार वरचेवर कोकणात उतरत, मुलूख जिंकीत. पण देशावर निजाम, संभाजीराजे, मोगल ही राजकारणे चालू असल्यामुळे पेशव्यांना कोकणात लक्ष द्यावयास फारशी फुरसद होत नव्हती. वर सांगितल्याप्रमाणे १७३६ साली सिद्दीशी तह झाल्यावर त्यांना जरा उसंत मिळाली. याच वेळी पोर्तुगी-<noinclude></noinclude>
j69w90rzzw4tgz9pvmdppjvtwkss3sa
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६४
104
73642
230939
164783
2026-06-09T03:26:30Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230939
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५३६}}</noinclude>जांच्या धर्मछळाला कोकणातील हिंदू लोक कंटाळून गेले होते. तेव्हा मग कोकणचा सोक्षमोक्ष करावयाचे ठरले. आणि वसईची मोहीम मुरू झाली. आणि १७३८ च्या डिसेंबरात चिमाजी आप्पा कोकणात उतरला. त्या आधीच ठाण्याचा किल्ला मराठयांनी घेतला होता. त्यामुळे त्यांची बाजू बळकट झाली होती. चिमाजी आप्पा आल्यावर माहीम, तारापूर, वेसावे, मढ अशा अनेक लढाया झाल्या, त्या सर्व मराठ्यांनी जिंकल्या. त्यात माहीम व तारापूर हे संग्राम फार निकराचे झाले. त्यामुळे मराठयांचे मनोधैर्य वाढले. आणि वसई घेणे त्यांना सुलभ झाले. वसईचा वेढा तीन महिने चालू होता. याच वेळी गोव्याकडून काही मदत येऊ नये म्हणून आप्पाने व्यंकटराम यास तिकडे पाठविले होते. तेथे त्याने मोठा पराक्रम करून गोवा पादाक्रांत करण्याची वेळ आणली होती. वसईला पोर्तुगीजांनी लढण्याची शिकस्त केली. पण त्यांचे काही चालले नाही. शरणागती पतकरून त्यांना किल्ला मराठयांच्या हवाली करावा लागला. या विजयामुळे उत्तर कोकण संपूर्णपणे मराठ्यांच्या हाती आले. आणि एका पाश्चात्य सत्तेला ते नामोहरम करू शकतात असा त्यांचा लौकिक झाला. त्यामुळेच इंग्रजही नरम आले. त्यांनी बाजीरावाची मर्जी संभाळण्यासाठी चौल हे महत्त्वाचे ठिकाण त्याच्या ताब्यात दिले. यामुळे बाजीरावाचा आपल्यावरील वहीम नाहीसा होऊन मुंबईचे संरक्षण होईल, अशा अर्थाचा मुंबई कौन्सिलने ठरावच केला.
{{gap}}मराठ्यांचे बळ काय होते, याची यावरून कल्पना येईल. त्यांना दुहीने पोखरले नसते, शाहू छत्रपती स्वतः मराठ्यांचे नेतृत्व करीत असते, स्वतः ते मोहिमा करीत असते आणि कठोर शिस्त या देशाला त्यांनी लावली असती तर हिंदुस्थान जिंकणे मराठ्यांना अवघड नव्हते.

'''उत्तर दिग्विजय'''
{{gap}}१७३७ च्या मार्चमध्ये पेशवा बाजीराव याने दिल्लीवर स्वारी करून जे अपूर्व साहस केले आणि विजय मिळविला त्यावरून हे सहज दिसून येते. हा उत्तर दिग्विजय मराठयांनी माळव्यावर स्वारी केली, तेव्हापासूनच सुरू झालेला होता. मध्यंतरी इतर उद्योग निघाल्यामुळे त्याला जोर चढला नव्हता. १७३२ सालापासून त्या राजकारणाला पुन्हा जोर चढून १७३७ च्या दिल्लीस्वारीत त्याची परिणती झाली.
{{gap}}या स्वारीचे मुख्य कारण हेच होते की मराठ्यांचा उत्कर्ष मोगल बादशहाला आणि त्याच्या सरदार, सेनापतींना सहन होत नव्हता. बादशहा स्वतः दुबळा होता, अंगी पराक्रमही नव्हता आणि सारासार विचार करून निर्णय करण्याचे सामर्थ्यही त्याच्या ठायी नव्हते. त्याच्या दरबारात यामुळे दोन पक्ष झाले होते. सवाई जयसिंग आणि खान डौरान हा एक पक्ष आणि सादतखान, कमरुद्दिनखान व महंमदखान बंगष हा दुसरा पक्ष पहिल्या पक्षाचे म्हणणे असे की मराठ्यांचा मोड करणे, त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना नर्मदेच्या दक्षिणेस हाकलून लावणे; किंवा त्यांच्या पराक्रमास<noinclude></noinclude>
mv82d2s5b8coxd7naaguzgpj769uriv
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६५
104
73643
230940
164784
2026-06-09T03:26:42Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230940
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५३७|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>पायबंद घालणे हे आपल्याला शक्य नाही, तेव्हा त्यांच्याशी आपण सलोखा करावा, बाजीरावाला भेटीस बोलवावे आणि बादशाही साम्राज्याच्या रक्षणाची त्याच्यावरच जबाबदारी टाकावी. पण दुसऱ्या पक्षाला यात नामर्दपणा वाटत होता. आमच्या हाती सत्ता द्या, आम्हांला माळव्याची सुभेदारी द्या, निजामाला आपल्या साह्याला बोलवा म्हणजे आम्ही मराठ्यांना सहज जागी बसवू, असे हा पक्ष बादशहाला सांगत असे. बादशहाला कधी यांचे खरे वाटे, तर कधी त्यांचे. आणि मग त्या त्या मताप्रमाणे तो नेमणुका करी. पण दुसऱ्या पक्षाच्या लोकांच्या हाती सत्ता व सुभेदारी देऊन काहीच उपयोग झाला नव्हता. दर वेळी मराठ्यांनी त्यांना नामोहरम केले होते. त्यामुळे बादशहाची डळमळ होई, तो पुन्हा जयसिंहाच्या पक्षाला वळे. तसा तो एकदा वळाला आणि त्याने बाजीरावास भेटीस बोलावण्याचे ठरविले. पण त्यामुळे मुस्लिम पक्षात प्रचंड खळबळ माजली आणि सर्व मुस्लिमविश्व मराठ्यांच्या प्रतिकारार्थ सिद्ध झाले, तेव्हा या सर्व प्रकरणाचा कायमचा निकाल लावावयाचा अशा जिद्दीने बाजीराव १७३५ च्या धनत्रयोदशीला दक्षिणेतून निघाला.

'''राजपुतांना जिंकले'''
{{gap}}या उत्तर दिग्विजयासाठी दोन मोहिमा कराव्या लागल्या. रजपूत संस्थानिकांच्या भेटीगाठी घेऊन, त्यांच्याशी दृढ संबंध जोडून, त्यांची एक आघाडी उभी करणे हे पहिल्या मोहिमेत साधले. माळव्यामध्ये मराठ्यांनी उत्तम व्यवस्था लावून रयतेची आबादानी केली होती. त्यामुळे मोगलांपेक्षा मराठ्यांची सत्ता जास्त हितावह आहे हे रजपूत सरदारांना आणि रयतेलाही कळून चुकले. आणि ते सर्व मराठ्यांना अनुकूल झाले. त्यामुळे बाजीराव उदेपुरास पोचेपर्यंत वाटेत अनेक राजपूत सत्ताधीशांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. उदेपूर हे मुख्य संस्थान. तेथला राणा जगत् सिंह याने बाजीरावाच्या स्वागतासाठी सुवर्ण सिंहासन केले होते. पण बाजीरावाने सांगितले की खरे चक्रवर्ती आपण आहांत, तो मान आपला आहे. असे म्हणून तो दुसऱ्या खालच्या आसनावर बसला. या कृत्यामुळे त्याने सर्व राजपुतांची मने जिंकली आणि हिंदुपदपातशाहीच्या सिद्धीचे एक पाऊल पुढे पडले.
{{gap}}याच वेळी बादशहाशी तह व्हावयाचा होता. २० लाख रुपये नक्त, ४० लक्षांची माळव्यात जहागीर, आणि भोपाळकरांचे मुलखात तनखा, असा तह करण्याचे बादशहाने मान्य केले होते. पण वाटाघाटीचा घोळ संपला नाही. मुस्लिम सरदार आणि निजाम यांनी पुनः पुन्हा विरोध केला आणि यातच मे महिना उजाडल्यामुळे बाजीरावाला परत फिरावे लागले. तेव्हा त्या वेळी परत फिरून तो १७३६ च्या नोव्हेंबरात निघून १७३७ च्या जानेवारीत भेलशाला आला.
<noinclude></noinclude>
duusfrdlfdrzy0v8bp2q6gn274nx8ao
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६६
104
73644
230941
164785
2026-06-09T03:26:55Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230941
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५३८}}</noinclude>
'''चलो दिल्ली'''
{{gap}}ही मोहीम अगदी जगड्व्याळ होही. १००० मैल लांब व ५०० मैल रुंद एवढ्या विस्तृत प्रदेशात युद्धाचा भडका झाला होता. भेलसा, भोपाळ, वोडशा, दतिया, भदावर, अटेर, दुआब व शेवटी दिल्ली असे हे संग्राम झाले. प्रत्येक ठिकाणी मराठ्यांना विजय मिळाला. एकदा दुआबात मात्र त्यांचा पराभव झाला. पण तेवढ्यावरून, सादतखानाने आपण मराठ्यांना बुडविले, अशी बादशहापाशी फुशारकी मारली. बादशहालाही ते खरे वाटून त्याने त्याचा मोठा गौरव केला. पण चारपाच दिवसांतच २८ मार्च १७३७ ला बाजीराव दिल्लीवर जाऊन कोसळला; तेव्हा त्याचा भ्रमनिरास होऊन पळून जाण्यासाठी त्याने यमुनेत नावाही जमविल्या. त्याने प्रत्यक्ष लढाई का केली नाही ? बाजीरावासारख्या भुरट्या चोराचे अंगावर स्वतः बादशहाने जाणे शोभत नाही, असे त्याच्या सरदारांचे मत पडले !
{{gap}}या वेळी बाजीरावाने दहा दिवस अहोरात्र प्रवास करून दिल्लीवर घाला घातला होता. मराठे बुडाले नाहीत, मराठे आहेत, हेच त्याला दाखवावयाचे होते. दिल्ली मारावी असा या वेळी विचारच नव्हता. ते शक्यही नव्हते. पण मराठ्यांचा दणका बादशहाला कळला म्हणजे त्याचे व सरदारांचे डोळे उघडतील हा यातील हेतू होता. तो सिद्ध झाल्यामुळे बाजीराव लगेच परत फिरला. वाटेत एकदोन संग्राम झाले. ते जिंकून पावसाळ्याच्या प्रारंभी तो दक्षिणेत परत आला.
{{gap}}त्याला अडविण्यासाठी वाटेत निजाम आडवा आलेला होता. पण त्याला चुकवून बाजीराव निसटून खाली आला. त्या वेळी त्याच्याशी संग्राम करणे सोयीचे नव्हते. सैन्य सर्व थकलेले होते. म्हणून पावसाळा दक्षिणेत काढून बाजीराव १७३७ च्या ऑक्टोबरमध्ये परत उत्तरेत आला.

'''भोपाळ - निजाम'''
{{gap}}या वेळी उभयपक्षांची फार जंगी तयारी होती. या वेळी बादशाही तारणारा एक काय तो निजाम, असे बादशहाला वाटत होते. म्हणून त्याला दिल्लीला बोलावून बादशहाने त्याचा मोठा गौरव केला. आणि मोठी फौज व मुबलक पैसा घेऊन, माळव्यातून मराठ्यांना कायमचे हाकलवून देतो अशी प्रतिज्ञा करून, निजाम बुंदेलखंडात शिरला. तसे झाले असते तर चाळीस वर्षांचा मराठ्यांचा उद्योग फुकट जाईल हे जाणून बाजीरावही ऐंशी हजार फौज घेऊन, निघाला आणि भोपाळवर त्याने निजामाला कोंडले. त्याचा पुत्र नासिरजंग दक्षिणेतून त्याच्या मदतीला निघाला होता. त्याला वाटेतच चिमाजी आप्पाने अडवून ठेवले. दिल्लीहून येणाऱ्या फौजांचा शिंदे होळकरांनी नाश केला, सुजायतखान येत होता त्याला रघुजी भोसले याने ठार केले. तेव्हा निजामाचा नाइलाज झाला आणि शरणागती पतकरून तो तहास तयार झाला.<noinclude></noinclude>
ibus1u5sgy9zufz836nei0k5aiyluk2
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६७
104
73645
230942
164786
2026-06-09T03:27:44Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230942
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५३९|| स्वराज्याचे साम्राज्य}}</noinclude>माळवा प्रांत देणे, नर्मदा व चंबळ यांतील सर्व मुलूख देणे, मराठ्यांच्या खर्चाने ५० लाख देणे, अशा तहाच्या अटी होत्या. ७ जानेवारी १७३८ रोजी निजामाने सह्या केल्या व अडीच तीन वर्षे चाललेले हे मराठ्यांचे युद्ध संपले. सर्व भारतात मराठे अजिंक्य ठरले आणि स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर झाले.

'''छत्रपतींचा विरोध'''
{{gap}}हे जे साम्राज्य झाले त्याचा पाया याच वेळी जास्त दृढ आणि व्यापक असा करता आला असता. निजामाचा कायमचा नाश करणे या वेळी सहज शक्य होते. बाजीरावाचे कर्तृत्व व त्याने निर्माण केलेले नवे कर्ते पुरुष यांना हे सहज शक्य होते. पण शाहू छत्रपती यांचा याला सक्त विरोध होता. पालखेडनंतर बाजीरावाचा निजामाला नेस्तनाबूद करण्याचा मनसुबा होता. पण छत्रपतींनी त्यास लिहिले की 'नबाबाचा व स्वामीचा सल्ला आहे. तेव्हा भागानगराकडे स्वारीस जाऊ नये.' पुन्हा खानदेशात निजाम शिरला असता बाजीरावाने तसाच विचार केला होता. पण शाहू- महाराजांनी कठोरपणे त्याला लिहिले की 'तुम्ही नबाबाचे नजीक राहू नये. त्यांच्या स्नेहास अंतर करू नये.' महाराजांनी आज्ञापत्र लिहून शपथपूर्वक आज्ञा केली की नबाबाची मर्जी राखावी. कै. नानांच्या पायाची शपथ सांगितली. नबाबाशी कलह न केला पाहिजे. (पे. द. उतारा, सरदेसाई, पेशवा बाजीराव, पृ. ११०).
{{gap}}या वेळी निजामास पूर्ण गारद केला असता तर सर्व दक्षिण लवकरच मराठ्यांना निर्वेध करता आली असती. पण मराठा छत्रपतींचाच त्याला विरोध होता.

'''पातशाहीचे रक्षण'''
{{gap}}दुसरे शाहू छत्रपतींचे घातकी धोरण म्हणजे त्यांची दिल्लीच्या बादशहाविषयीची भक्ती. पातशाहीचे रक्षण करणे हे ते आपले कर्तव्य मानीत. औरंगजेबाच्या मुलीने त्यांचा संभाळ केला होता. म्हणून ते तिला मातृस्थानी व तिच्या बंधूंना मातुलस्थानी मानीत असत. तेव्हा 'मातृस्थानी विरोध करणे कामाचे नाही, असे मनात येऊन बादशहाची स्वस्थता राखून सपूर्ण सत्ता वागवावी हा इरादा मनातील' शाहू महाराज बादशाहीला शिवमंदिर मानीत, तेव्हा नवे मंदिर उभारण्यापेक्षा जुन्याचा जीर्णोद्धार करणे त्यांना जास्त पसंत होते (पृ. ३३३, ३३४).
{{gap}}शाहूछत्रपतींच्या या धोरणाचा विचार मराठयांच्या साम्राज्याचा विचार करताना कायम मनात ठेवणे अवश्य आहे.

{{center|■}}<noinclude></noinclude>
374n59fx8ym2wwxudipmfw0d1vn6clr
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६८
104
73646
230943
164787
2026-06-09T03:28:04Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230943
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" /></noinclude>{{Css image crop
|Image = महाराष्ट्र_संस्कृती.pdf
|Page = 568
|bSize = 399
|cWidth = 323
|cHeight = 141
|oTop = 84
|oLeft = 38
|Location = center
|Description =

{{rh|'''२८.'''||'''साम्राज्याचा विस्तार'''}}

'''साम्राज्याचे स्वरूप'''
{{gap}}'स्वराज्याचे साम्राज्य' असा मागल्या लेखाचा मथळा होता आणि 'साम्राज्याचा विस्तार' असा याचा आहे. पण साम्राज्य या शब्दाचा अर्थ आपण नीट समजावून घेतला पाहिजे. आज साम्राज्य शब्दाला जो रूढ अर्थ आहे त्या अर्थाने मराठ्यांचे साम्राज्य भारतात कोठेच नव्हते. प्रथम दक्षिणच्या सहा सुभ्यांत त्यांनी चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क मिळविले. तसेच हक्क पुढे माळवा, बुंदेलखंड व राजस्थानचा काही प्रदेश येथे त्यांनी मिळविले. त्यानंतर नानासाहेबांच्या कारकीर्दीत आग्रा, मुलतान, प्रयाग, बंगाल, बिहार, ओढ्या, पंजाब या प्रदेशात अशाच प्रकारचे हक्क त्यांना मिळाले. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार तो हाच. पण राज्याचा बंदोबस्त, संरक्षण, व्यवस्थित सारावसुली, व्यापार, शेती यांचे संरक्षण आणि सर्व सार्वभौम सत्ता या अर्थी मराठ्यांचे साम्राज्य वरीलपैकी एकाही प्रांतात नव्हते. चौथाईबरोबर येणारी कर्तव्ये म्हणजे प्रदेशाचे संरक्षण, बंदोबस्त व लोकांचे संरक्षण हेही मराठयांना कोठे करता आले नाही. वरील प्रदेशात त्यांना चौथाईचे हक्क मिळाले हे खरे. पण लष्कर घेऊन गेल्याखेरीज कोठेही केव्हाही त्यांना पैसा वसूल करता आला नाही. शांतता व सुरक्षितता ही महाराष्ट्रात, जेथे त्यांचे स्वराज्य होते त्या भागातसुद्धा, निर्वेध चालली होती असे नाही. निजामादी त्यांचे शत्रू येथे येऊन लुटालूट, जाळपोळ करीत असेच नव्हे,<noinclude></noinclude>
ihxj1s9pmbryf0ij6qkzwi3savd7azx
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६९
104
73647
230944
164789
2026-06-09T03:28:43Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230944
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५४१|| साम्राज्याचा विस्तार}}</noinclude>तर दाभाडे, गायकवाड हे मराठे सरदारही हेच करीत असत. हे सर्व ध्यानी घेऊनच आपण 'मराठी साम्राज्य' हा शब्द वापरला पाहिजे.

'''हुकमत नाही'''
{{gap}}याची कारणे अनेक आहेत. त्यांचा विचार आपल्याला त्या त्या प्रकरणात करावयाचा आहेच. पण मुख्य कारण एकच की मराठे एका हुकमतीत कधीच वागत नसत. प्रत्येकाचा सुभा स्वतंत्र असे. तो त्यांना शाहू छत्रपतींनी दिलेला असला तरी त्यांच्या आज्ञाही ते कधी पाळत नसत. आणि एकमेकांच्या प्रांतातही, हवी तेव्हा, हवी तशी लुटालूट, जाळपोळ, करीत असत. ताराबाई ही नानासाहेब पेशव्याचा मुख्य शत्रू होती. प्रतिनिधी, सचिव, मंत्री, अमात्य, दाभाडे, रघुजी भोसले, गायकवाड, यमाजी शिवदेव, पिलाजीचा मुलगा जोत्याजी जाधव, गोविंदराव चिटणीस, कदमबांडे, हे सर्व सर्व नानासाहेब पेशव्यांचे शत्रू होते. ताराबाई यांना चिथावून देई. ते निजामाला जाऊन मिळत. आणि मराठी राज्याचे शक्य ते नुकसान करीत. यांपैकी अनेकांना, तुम्ही पेशवेपद घ्या, असा शाहू महाराजांनी आग्रह केला होता. एकदा तर नानासाहेबाला त्यांनी दोन महिने पेशवे पदावरून दूरही केला होता. त्यावेळी पेशवेपद स्वीकारण्यास कोणीही पुढे आला नाही. तरी शाहू छत्रपतींचे, पेशव्यांचे म्हणजेच मराठ्यांचे राज्य नीट चालू द्यावयाचे नाही, असा जणू काय त्या प्रत्येकाचा निर्धार होता. सर्व मराठे एक असते, त्या सर्वांना एका हुकमतीत वागविणारे छत्रपती त्यांना लाभले असते, तर हिंदुपद पादशाहीचे शिवछत्रपतींचे ध्येय निश्चित साध्य झाले असते. पण तसे झाले नाही. या सरदारांपैकी कोणालाही कसलीही निष्ठा नव्हती. धर्मनिष्ठा नाही, राष्ट्रनिष्ठा नाही, स्वामीनिष्ठा नाही. अशा स्थितीत नानासाहेब पेशव्याने साम्राज्याचा जो काही विस्तार केला तोच त्याचा विशेष पराक्रम होय, असे सरदेसाई म्हणतात, ते अगदी खरे आहे.

'''कर्नाटक'''
{{gap}}आता १७४० ते १७६१ या एकवीस वर्षांच्या काळात नानासाहेबांच्या कारकीर्दीत मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार कसा कसा झाला ते इतिहासक्रमाने न पाहता एकेका प्रदेशाच्या हिशेबाने पाहू. तशानेच या साम्राज्याची सम्यक कल्पना येईल. १७४० साली तंजावरच्या गादीवर प्रतापसिंह भोसले हा आला. तो दुबळा होता. यावेळी अर्काटच्या नबाबाचा जावई चंदासाहेब फार प्रबळ होता. तो तंजावर आक्रमिणार, असा सुमार दिसू लागला. तेव्हा छत्रपती शाहू यांनी फत्तेसिंग भोसले आणि नागपूरचा सेनासाहेब सुभा रघूजी भोसले यांस त्यावर पाठविले. यावेळी रघूजीने मोठा पराक्रम केला. त्याने अर्काटचा नवाब दोस्त अल्ली यास ठार मारले, त्याच्या सैन्याची धूळधाण केली, नवाबाचा मुलगा सफ्दर अल्ली याच्याकडून एक कोट रुपये<noinclude></noinclude>
p2xdj6skihtuwdnvoily5ub73a1z2eb
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७०
104
73648
230945
164790
2026-06-09T03:28:53Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230945
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५४२}}</noinclude>घेऊन त्यास अर्काटचा नवाब केले आणि चंदासाहेबास कैद करून साताऱ्यास आणून ठेविले. त्यामुळे संतुष्ट होऊन, शाहूमहाराजांनी वऱ्हाड, गाेंडवण, बंगाल इ. पूर्वकडच्या प्रांतांची कामगिरी त्याला सांगून त्याच्या सनदाही दिल्या.

'''सर्व व्यर्थ'''
{{gap}}हा पराक्रम मोठा झाला. पण त्याचे पुढे काय ? यावेळी प्रथम बाजीराव उत्तरेत होता. तिकडेच तो मृत्यू पावला. त्यानंतर नानासाहेब पेशवा झाला आणि तो माळव्यावर निघून गेला आणि रघूजी पण नागपुराकडे निघून गेला. हे पाहताच सर्व सैन्य घेऊन निजाम कर्नाटकात उतरला (१७४३ मार्च). त्याने अन्वरुद्दिन हा नवीन माणूस अर्काटचा नवाब म्हणून नेमला. एवढी सेना पाहून कडप्पा, बेदनूर, सावनूर येथले नवाबही भयभीत झाले आणि निजामापुढे वाकले आणि अशा रीतीने मराठ्यांचा दोन वर्षांचा उद्योग निजामाने दोन महिन्यात सर्व व्यर्थ करून टाकला.

'''महत्त्वाचे कारण'''
{{gap}}कर्नाटकाचा सुभा शाहू छत्रपतींनी फत्तेसिंग भोसले आणि त्याचा स्नेही बाबूजी नाईक यांच्याकडे सोपविला होता. पण ते दोघेही नाकर्ते, दुबळे होते. या बाबूजी नाईकाला पेशवेपदाची हाव होती आणि रघूजी भोसल्याचा त्याला पाठिंबा होता. पण ती त्याला न मिळाल्यामुळे त्या दोघांनी नानासाहेबांशी कायम वैर धरले. निजामाने कर्नाटकात सर्व विध्वंस केल्यावर बाबूजीला चांगली संधी होती. त्याला तशी घमेंडही होती. म्हणून तिकडील देसाई, नवाब यांच्याकडून वार्षिक खंडणी गोळा करण्यासाठी तो गेला. पण त्या देसायांनी व संस्थानिकांनी याचाच मोड करून त्यालाच लुटले आणि फौजेच्या निमित्ताने बाबूजीला कर्ज मात्र भरमसाट झाले. आणि मौज अशी की त्या कर्जाचे निवारण करावे, म्हणून तो छत्रपतींच्याच दाराशी धरणे धरून बसला ! अशा वेळी छत्रपतींनी त्याच्याकडून कर्नाटकचा सुभा काढून घेऊन त्याला वास्तविक हाकलून द्यावयाचे. पण तसा कडवेपणा त्यांच्या अंगी नव्हता. यशवंतराव दाभाडे गुजराथचा कारभार करीना. तो व्यसनाधीन होऊन पडून असे. तरी तो सुभा महाराजांनी त्याच्याकडून काढला नाही. बाबूजी नाइकाकडून कर्नाटक काढला नाही. मराठ्यांच्या राज्याला व साम्राज्याला सामर्थ्य असे कधीच प्राप्त झाले नाही, त्याच्या अनेक कारणांपैकी हे एक आहे.
{{gap}}पुढे १७४८ साली निजाम मृत्यू पावला, तेव्हा त्याचे मुलगे आणि नातू मुजफर जंग यांच्यांत भांडणे लागली. तेव्हा मराठ्यांच्या व फ्रेंचांच्या मदतीने, चंदासाहेब आणि मुजफरजंग यांनी अन्वरुद्दिन यास ठार मारले. आणि मुजफरजंग निजाम झाला व चंदासाहेब अर्काटचा नवाब झाला. याच वेळी अन्वरुद्दिन याचा एक मुलगा महंमद अल्ली हा इंग्रजांकडे गेला. तेव्हा कर्नाटकात इंग्रज आणि फ्रेंच यांचे द्वंद्व उभे राहिले.
<noinclude></noinclude>
jnip66es596s2mcpsxn6gjsg50dt16e
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७१
104
73649
230946
164791
2026-06-09T03:29:19Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230946
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५४३|| साम्राज्याचा विस्तार}}</noinclude>{{gap}}यावेळी स्वतः नानासाहेब दक्षिणेत गेला असता तर कदाचित काही कायमची व्यवस्था झाली असती. पण शाहूछत्रपती आसन्नमरण झाले होते. त्यामुळे तेथे मोठेच राजकारण निघाले होते. पुढे १७५१ साली त्याने निजामावर स्वारी केली आणि बुसी या फ्रेंच सेनापतीचा तोफखाना निजामाकडे असूनही पारनेरजवळ मराठ्यांनी त्याचा पराभव केला व निजामाकडचा चार लक्षांचा मुलूख मिळविला.

'''फक्त चौथाई'''
{{gap}}यानंतर पुढच्या नऊ वर्षांत, अनेक राजकारणे, अनेक घडामोडी झाल्या. निजाम सलाबतजंग याला रामदासपंत नावाचा एक मोठा कर्तबगार दिवाण मिळाला होता. जानोजी निंबाळकरांसारखे मराठे फितूर करून त्याने मराठ्यांना अनेक वेळा शह दिला. पण १७५२ साली त्याच्याच बिथरलेल्या फौजेने त्याचा खून केला. निजाम सलाबत जंगाचा एक भाऊ गाजीउद्दीन दिल्लीला होता. तो मराठ्यांना अनुकूल होता. त्याला निजामपदी बसवावा असा नानासाहेबांचा बेत होता. पण निजाम उल्मुल्काचा धाकटा भाऊ निजाम अल्ली याच्या आईने तो दक्षिणेत आल्यावर त्याला विष घालून मारले (१७५२). तेव्हा भालकी येथे सलाबतजंगाशी तह करून खानदेशपर्यंतचा सर्व मुलूख मराठ्यांनी मिळविला. यानंतर १७५३, १७५४ व १७५५ साली नानाने लागोपाठ कर्नाटकावर स्वाऱ्या केल्या व खंडण्याही गोळा केल्या. १७५७ च्या लढाईत पुन्हा त्यांनी निजामाचा मोड केला. पण मराठे इकडे गुंतलेले असताना श्रीरंगपट्टणच्या बंदिराजाने पेशव्याने १७५५ साली घेतलेले सर्व परगणे परत घेतले. याच वेळी श्रीरंगपट्टणला हैदरचा उदय झाला व त्याचा मोड करणे हेच पेशवा माधवराव याचे एक काम होऊन बसले. १७६० साली निजामाचा कायमचा निकाल लावण्यासाठी मराठ्यांनी उद्गीर येथे त्याचा पुरा धुव्वा उडविला. पण त्यानंतर लगेच पानपतचे प्रककरण उद्भवून सदाशिवरावास तिकडे जावे लागले. दक्षिणचा बंदोबस्त त्यांच्या हाती आला. तसे कोणत्याही प्रांतात केव्हाही झाले नाही. दरसाल जाऊन चौथाई व इतर खंडणी वसूल करणे व तेवढ्या वेळापुरता बंदोबस्त ठेवणे एवढाच मराठ्यांच्या साम्राज्याचा अर्थ होता.

'''कर्तृत्व नाही'''
{{gap}}कर्नाटकाच्या या प्रकरणावरून एक गोष्ट पुन्हा ध्यानात येईल की मराठी राज्यात एक हुकमत अशी नव्हती. आणि मराठ्यांच्या जवळ सर्व हिंदुस्थानचा कारभार आटपता येईल अशी कर्ती माणसे नव्हती. अशी माणसे निष्ठेने व भौतिक विद्येमुळे निर्माण होत असतात. पण मराठ्यांत या दोन्ही गोष्टींचा संपूर्ण अभाव होता. मराठ्यांच्या साम्राज्याचे स्वरूप जे वर वर्णिले आहे त्याचे मुख्य कारण हे आहे.
<noinclude></noinclude>
axr0mmh5vtf2uadyv7etm5ffamf5oqj
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७२
104
73650
230947
164792
2026-06-09T03:29:48Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230947
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|महाराष्ट्र संस्कृती||५४४}}</noinclude>
'''रजपूत प्रकरण'''
{{gap}}शरीरात प्राणतत्त्व आहे तोपर्यंत त्याचे भिन्न अवयव एकमेकांशी दृढपणे संलग्न असे राहतात. ते तत्त्व क्षीण झाले की अवयव विलग होऊन शेवटी तुटून पडतात. तेच समाजाचे आहे. ध्येयवाद, उच्च निष्ठा, काही तत्त्वे म्हणजेच प्राणतत्त्व होय. ते क्षीण झाले की समाज फुटू लागतो व त्याचे बळ नाहीसे होते. बाजीरावाअखेर तो व त्याने नव्याने निर्माण केलेले शिंदे, होळकरादी सरदार यांच्यात स्वामिनिष्ठा होती आणि हिंदुपदपातशाहीचे ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर होते. रजपुतांना बाजीरावाने अतिशय मान दिला आणि त्यांशी सख्य राखले, याचे कारण हेच होय. पण त्याच्या नंतर हे ध्येय मनात कायम असले तरी प्रत्यक्षात राहिले नाही. आणि रजपूत हे मराठ्यांचे शत्रू बनले !

'''पैसा हे तत्त्व'''
{{gap}}१७४३ साली जयपूरचा राणा सवाई जयसिंग मरण पावला. त्याला ईश्वरीसिंग व माधवसिंग हे दोन पुत्र. जयसिंगामागे ईश्वरीसिंग हा राणा झाला. पण १७४६ साली माधवसिंगाचा आजा मेवाडचा राणा जगत् सिंह याने माधवसिंगाच्या बाजूने ईश्वरीसिंगाशी युद्ध सुरू केले. ईश्वरीसिंगाने मराठयांची मदत मागितली. त्यावेळी शिंदे-होळकर तेथे होते. त्यांनी ईश्वरीसिंगास मदत करण्याचे ठरविले. बादशहानेही ईश्वरीसिंगास मान्यता दिली. पण यावेळी जगत् सिंगाने पेशव्यांकडे वकील धाडले व मोठा नजराणा करून माधवसिंगाचा पक्ष घ्यावा अशी विनंती केली. त्यावेळी नानासाहेबांनी जगत्- सिंगास निक्षून सांगावयास हवे होते की आम्ही एकदा ईश्वरीसिंगाचा पक्ष घेतला आहे, त्यात बदल होणे शक्य नाही. पण त्याने तसे केले नाही. त्यास पैशाची फार निकड होती. पैसा ही मराठी राज्याची कायमची व्यथा होती. सर्व हिंदुस्थानचा व्याप संभाळावयाचा म्हणजे फार मोठी फौज पाहिजे. तिला पैसा कधीही पुरत नसे. पण याशिवाय मोठे कारण म्हणजे शाहू छत्रपतींचा खर्च. त्यांच्या खर्चाला सुमारच नसे. आणि सगुणाबाई व सकवारबाई या त्यांच्या राण्यांना कर्ज किती करावे याची काही मर्यादाच राहिली नव्हती ! त्यामुळे शाहूछत्रपती नेहमी पेशव्यांच्या मागे पैशाचा लकडा लावीत. पैशांची विवंचना नाही, असे या पेशव्यांचे एकही पत्र आढळणार नाही. अहोरात्र पैशाची चिंता ! त्यामुळे माधवसिंग बराच नजराणा करतो हे पाहून, त्याने त्याचा पक्ष घ्यावा असे ठरविले. येथे हिंदुपदपातशाहीही संपुष्टात आली. रजपुतांना मिळवून घ्यावयाचे आहे, हे धोरण संपले. जो पैसा जास्त देईल त्याकडे मराठे जाणार, त्यांना तत्त्व, ध्येय काही नाही, असा त्यांचा दुलौकिक झाला. होळकरानेही यावेळी मूळपक्ष सोडला आणि तो माधवसिंगाला मिळाला. यामुळे शिंदे- होळकरांचे कायमचे वाकडे येऊन पुढे पानपतावर आणि उत्तरेच्या राजकारणात कायमचा बिघाड झाला.
<noinclude></noinclude>
imgpti2yk2hvo6apvzusaexqjbvvmnm
पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७३
104
73651
230948
164798
2026-06-09T03:32:12Z
Priyanka Choudhari
4169
/* प्रमाणित */
230948
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="Priyanka Choudhari" />{{rh|५४५|| साम्राज्याचा विस्तार}}</noinclude>
'''दुर्लौकिक'''
{{gap}}जे जयपुराच्या बाबतीत झाले तेच पुढे १७५४ साली जोधपूरच्या बाबतीत झाले. १७५२ साली विजयसिंग हा जोधपूरच्या गादीवर आला. त्याचा चुलत भाऊ रामसिंग यास ती गादी हवी होती. या वेळी जयाप्पा शिंदे व मल्हारराव उत्तरेत होते. तेव्हा रामसिंग जयाप्पास जाऊन भेटला. पण जोधपूरचे हे साहस आपण अंगावर घेऊ नये, अंतर्वेदीत आपल्याला पुष्कळ काम आहे, अयोध्या, काशी इ. तीर्थक्षेत्रे मुक्त करावयाची आहेत, असे मल्हाररावाने आणि इतर सरदारांनी जयाप्पास परोपरीने सांगून पाहिले. पण तो हट्टास पेटला होता. त्या वेळी सर्वांवर हुकमत चालविणारा मराठ्यांत कोणी नव्हता. सर्वच मुखत्यार. त्यामुळे जयाप्पाने जोधपूरचे काम अंगावर घेतले. त्यात त्याची दोन वर्षे वाया गेली. इतकेच नव्हे, तर विजयसिंगाने दग्याने त्याचा खून केला. शेवटी दत्ताजी शिंदे याने विजयसिंगाचा पराभव करून पन्नास लाख रुपये वसूल केले आणि रामसिंगास निम्मे राज्य मिळवून दिले. पण त्याचे आणखी सहा महिने यात वाया गेले. या वेळी मल्हाररावाची विजयसिंगास फूस होती, असा एक प्रवाद होता. त्यामुळे शिंदे व होळकर यांचे अगदी हाडवैर झाले. दत्ताजीने दुखवट्यासाठी आलेल्या मल्हाररावाची गाठही घेतली नाही. अशा रीतीने रजपूत कायमचे दुखावले गेले, शिंदे-होळकर यांच्यांत कायम बिघाड झाला आणि मराठ्यांचा सर्वत्र दुर्लोकिक झाला.

'''हिंदू जमाती'''
{{gap}}रजपूत, जाट व शीख यांच्या संबंधात मराठ्यांनी उत्तरेत जे राजकारण केले, त्याचा विचार उद्बोधक होईल, असे वाटते. बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी मेवाडचा राणा जगत् सिंग याचा मान करून सर्व रजपुतांची मने जिंकून घेतली होती. पण पुढे हे धोरण राहिले नाही. किंबहुना हिंदुपदपातशाही असा घोष उच्चारण्यापलीकडे मराठ्यांनी, त्यांचे कवी, त्यांचे कीर्तनकार, त्यांच्यांतील सत्पुरुष यांनी या ध्येयासाठी काहीही केले नाही. मुस्लिम मुल्ला मौलवींचा असा प्रचार नेहमी चालू असे. नजीबखान रोहिला याचे राजकारण नेहमी असेच चालू असे. अंतर्वेदीत रोहिल्यांची एक वसाहतच झाली होती. हे सर्व अफगाण होते. आणि दिल्लीची मोगल बादशाही नष्ट करून अबदालीला बादशहा करावे, असा त्यांचा मनसुबा होता. मराठ्यांनी चौथाईच्या बदल्यात बादशाहीचे रक्षण करण्याची जबाबदारी शिरावर घेतली होती. तेव्हा रोहिले व अबदाली यांशी यांचा सामना होणार, हे तेव्हापासूनच ठरले होते. यामुळे शीख, जाट व रजपूत यांशी संघटन करण्याचा मराठ्यांनी कसून प्रयत्न केला असता तर पानपतला त्यांना अपयश आले नसते, किंबहुना पानपतचा प्रसंग उद्भवलाच नसता, असे इतिहासपंडितांचे मत आहे.
<noinclude>
{{gap}}३५</noinclude>
ibqapj2ncf7buuizd6ew0kt77p0r0c5
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११९
104
85883
230949
182077
2026-06-09T05:54:00Z
JayashreeVI
4058
230949
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="Priyanka Choudhari" />{{rh|१ |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>जी नेमणूक केली होती ती सारखी चालू होती व चाफळच्या मठाची व्यवस्था अजूनही भिक्षेवरच चालू होती; हें या केशव गोसाव्याच्या पत्रावरून दिसतें, या पत्रांतील मजकुराचा विचार केला व मागे दिलेल्या पत्रांचा विचार केला तर शिवाजीची प्रथम भेट याच सालांत झाली याबद्दल मनाची बालंबाल खात्री होते. पण रा. देव व रा. राजवाडे या पत्रांतही भास्कर गोसाव्याच्या पत्राप्रमाणे क्लिष्ट कल्पना व व्यंग्यार्थ काढतात. राजवाड्यांच्या मतें प्रथम भेट याच्या आधीं ‘या मुलाखतीतील' असे शब्द गृहीत धरावे म्हणजे झालें! मग या पत्राचा असा अर्थ होतो
कीं, महाराजांच्या व समर्थांच्या पूर्वी किती तरी मुलाखती झाल्या होत्या व अशा एका मुलाखतींतील ही प्रथम भेट होय. रा. राजवाडे यांची ही कल्पना वाचून या लेखकास पुनर्विवाहाच्या वेळच्या वादाची आठवण झाली. त्या वादाचे वेळीं' 'नष्टेमृते' या प्रसिद्ध श्लोकाचा पुनर्विवाहपर अर्थ खोडण्याकरितां 'पतीच्या' ठिकाणी 'अपति' असें रूप धरावें म्हणजे झाले अशी क्लिष्ट कल्पना जुन्याच्या अभिमान्यांनी काढली होती त्यासारखीच रा. राजवाडे यांचीहि कल्पना आहे. त्या वादाची त्यांना माहिती नसल्यामुळे त्या वेळची सोपी युक्ति त्यांना सुचली नसावी व
म्हणून 'या मुलाखतीतील' इतकें लांबलचक पद गृहीत धरण्याची कल्पना त्यांना काढावी लागली! नाहींतर इतके जास्त शब्द घालण्या ऐवजी 'समर्थांचे' पाठीमागें 'अ' असें अक्षर आहे व म्हणून हें पत्र रामदास व शिवाजी
यांच्या भेटीबद्दल मुळींच नाहीं; व अर्थात् या पत्रावरून भेटीचा काल मुळींच शाबीत होत नाहीं असें त्यांना म्हणतां आलें असतें! मन एकदां पूर्वग्रहदूषित झाले म्हणजे तें अर्थ लावण्यांत काय काय मौज करूं शकतें याचा या पत्राचा वरील प्रकारचा व्यंग्यार्थ हा उत्तम मासला आहे.

{{gap}}पण पूर्वग्रहविरहित माणसास हें केशव गोसाव्याचें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या कालाचा प्रत्यक्ष पुरावा आहे हे उघड आहे. तेव्हां आतां हातच्या कांकणाला आरसा कशाला! पण रा. चांदोरकरांच्या
कागदपत्रांत असलीं आरसेवजाही पत्रे आहेत; त्यावरून या प्रश्नावर काय-<noinclude></noinclude>
00t08osofffx5yoz1xsr0jbi07ptfva
230950
230949
2026-06-09T05:54:33Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
230950
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{rh|१ |सज्जनगड व समर्थ रामदास.|}}
{{rule}}</noinclude>जी नेमणूक केली होती ती सारखी चालू होती व चाफळच्या मठाची व्यवस्था अजूनही भिक्षेवरच चालू होती; हें या केशव गोसाव्याच्या पत्रावरून दिसतें, या पत्रांतील मजकुराचा विचार केला व मागे दिलेल्या पत्रांचा विचार केला तर शिवाजीची प्रथम भेट याच सालांत झाली याबद्दल मनाची बालंबाल खात्री होते. पण रा. देव व रा. राजवाडे या पत्रांतही भास्कर गोसाव्याच्या पत्राप्रमाणे क्लिष्ट कल्पना व व्यंग्यार्थ काढतात. राजवाड्यांच्या मतें प्रथम भेट याच्या आधीं ‘या मुलाखतीतील' असे शब्द गृहीत धरावे म्हणजे झालें! मग या पत्राचा असा अर्थ होतो
कीं, महाराजांच्या व समर्थांच्या पूर्वी किती तरी मुलाखती झाल्या होत्या व अशा एका मुलाखतींतील ही प्रथम भेट होय. रा. राजवाडे यांची ही कल्पना वाचून या लेखकास पुनर्विवाहाच्या वेळच्या वादाची आठवण झाली. त्या वादाचे वेळीं' 'नष्टेमृते' या प्रसिद्ध श्लोकाचा पुनर्विवाहपर अर्थ खोडण्याकरितां 'पतीच्या' ठिकाणी 'अपति' असें रूप धरावें म्हणजे झाले अशी क्लिष्ट कल्पना जुन्याच्या अभिमान्यांनी काढली होती त्यासारखीच रा. राजवाडे यांचीहि कल्पना आहे. त्या वादाची त्यांना माहिती नसल्यामुळे त्या वेळची सोपी युक्ति त्यांना सुचली नसावी व
म्हणून 'या मुलाखतीतील' इतकें लांबलचक पद गृहीत धरण्याची कल्पना त्यांना काढावी लागली! नाहींतर इतके जास्त शब्द घालण्या ऐवजी 'समर्थांचे' पाठीमागें 'अ' असें अक्षर आहे व म्हणून हें पत्र रामदास व शिवाजी
यांच्या भेटीबद्दल मुळींच नाहीं; व अर्थात् या पत्रावरून भेटीचा काल मुळींच शाबीत होत नाहीं असें त्यांना म्हणतां आलें असतें! मन एकदां पूर्वग्रहदूषित झाले म्हणजे तें अर्थ लावण्यांत काय काय मौज करूं शकतें याचा या पत्राचा वरील प्रकारचा व्यंग्यार्थ हा उत्तम मासला आहे.

{{gap}}पण पूर्वग्रहविरहित माणसास हें केशव गोसाव्याचें पत्र रामदास व शिवाजी यांच्या भेटीच्या कालाचा प्रत्यक्ष पुरावा आहे हे उघड आहे. तेव्हां आतां हातच्या कांकणाला आरसा कशाला! पण रा. चांदोरकरांच्या
कागदपत्रांत असलीं आरसेवजाही पत्रे आहेत; त्यावरून या प्रश्नावर काय-<noinclude></noinclude>
ps9ypiu86z9uuz3lwq2fansfesxfb11