विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.8
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/५
104
69227
232654
230953
2026-06-25T07:09:36Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
232654
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>महात्मा फुले यांचे डाव्या हाताचे मराठी हस्ताक्षर<noinclude></noinclude>
jmk6w7v77jsstufzhgafcfnwlcwab86
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/९
104
69229
232655
230819
2026-06-25T07:13:36Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232655
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{right|(चार)}} {{left|महात्मा फुले समग्र वाङ्मय}}</noinclude>
चौथ्या आवृत्तीत छापलेल्या जोतीरावांच्या रंगीत छायाचित्रांऐवजी या पाचव्या
आवृत्तीत श्री. गोपीनाथराव पालकर या सत्यशोधक चळवळीतील नामवंत कार्यकर्त्याच्या
खासगी संग्रहातून डॉ. बाबा आढाव यांनी मिळवलेले कृष्णधवल छायाचित्र छापले आहे.
ते अस्सल असण्याची जास्त शक्यता वाटते.

{{gap}}पुणे येथील शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक श्री. अ. चाँ. सय्यद आणि त्यांचे सर्व
सहकारी यांनी संचालक श्री. प्रकाश मोरे आणि श्री. प्र. ल. पुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
अत्यंत परिश्रम घेऊन मुद्रणाचे काम पुरे केल्यामुळे ही पाचवी आवृत्ती २८ नोव्हेंबर या
महात्मा फुल्यांच्या स्मृतिदिनापूर्वी प्रकाशित करणे शक्य झाले आहे.
ग्रंथाचे मुद्रण चालू असताना श्री. हरि नरके यांनी पुण्यात तळ देऊन मुद्रित शोधनाच्या
कामात साहाय्य केले नसते तर ही आवृत्तीही वेळेवर प्रसिद्ध करता आली नसती. त्याबद्दल
त्यांचे ऋण शब्दामध्ये व्यक्त करणे कठीण आहे.

{{gap}}'महात्मा फुले समग्र वाङ्मय' या ग्रंथासारख्या ग्रंथाचे संपादन करण्याचे काम परिपूर्ण
होत नसते. नवीन संशोधनामुळे यापुढेही या ग्रंथात जशी भर पडत जाईल त्याप्रमाणे
सर्वसाधारण वाचकांची सोय, प्रतिक्रिया आणि त्यांच्या सूचना लक्षात घेऊन कालांतराने
नव्या संदर्भ टिपांचीही भर घालावी लागेल. याखेरीज ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर आढळलेले
मुद्रणदोष दूर करण्याचा प्रयत्नही सतत करावा लागतोच. तो यापुढेही केला जाईल.

नवीन प्रशासन भवन,

मंत्रालयासमोर,

मुंबई ४०० ०३२,

दि. २८ ऑक्टोबर १९९१

'''य. दि. फडके'''

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
<noinclude></noinclude>
3fkded37an7aqo8r87t78hzy58tljro
232656
232655
2026-06-25T07:14:52Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232656
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" />{{left|(चार)}} {{right|महात्मा फुले समग्र वाङ्मय}}</noinclude>
चौथ्या आवृत्तीत छापलेल्या जोतीरावांच्या रंगीत छायाचित्रांऐवजी या पाचव्या
आवृत्तीत श्री. गोपीनाथराव पालकर या सत्यशोधक चळवळीतील नामवंत कार्यकर्त्याच्या
खासगी संग्रहातून डॉ. बाबा आढाव यांनी मिळवलेले कृष्णधवल छायाचित्र छापले आहे.
ते अस्सल असण्याची जास्त शक्यता वाटते.

{{gap}}पुणे येथील शासकीय मुद्रणालयाचे व्यवस्थापक श्री. अ. चाँ. सय्यद आणि त्यांचे सर्व
सहकारी यांनी संचालक श्री. प्रकाश मोरे आणि श्री. प्र. ल. पुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली
अत्यंत परिश्रम घेऊन मुद्रणाचे काम पुरे केल्यामुळे ही पाचवी आवृत्ती २८ नोव्हेंबर या
महात्मा फुल्यांच्या स्मृतिदिनापूर्वी प्रकाशित करणे शक्य झाले आहे.
ग्रंथाचे मुद्रण चालू असताना श्री. हरि नरके यांनी पुण्यात तळ देऊन मुद्रित शोधनाच्या
कामात साहाय्य केले नसते तर ही आवृत्तीही वेळेवर प्रसिद्ध करता आली नसती. त्याबद्दल
त्यांचे ऋण शब्दामध्ये व्यक्त करणे कठीण आहे.

{{gap}}'महात्मा फुले समग्र वाङ्मय' या ग्रंथासारख्या ग्रंथाचे संपादन करण्याचे काम परिपूर्ण
होत नसते. नवीन संशोधनामुळे यापुढेही या ग्रंथात जशी भर पडत जाईल त्याप्रमाणे
सर्वसाधारण वाचकांची सोय, प्रतिक्रिया आणि त्यांच्या सूचना लक्षात घेऊन कालांतराने
नव्या संदर्भ टिपांचीही भर घालावी लागेल. याखेरीज ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर आढळलेले
मुद्रणदोष दूर करण्याचा प्रयत्नही सतत करावा लागतोच. तो यापुढेही केला जाईल.

नवीन प्रशासन भवन,

मंत्रालयासमोर,

मुंबई ४०० ०३२,

दि. २८ ऑक्टोबर १९९१

'''य. दि. फडके'''

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
<noinclude></noinclude>
iebr5w7at4rpgyxr86avphdja2sle8w
पान:महात्मा फुले समग्र वाङ्मय.pdf/४०
104
69261
232649
232625
2026-06-25T06:42:25Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232649
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{|
|+ '''अनुक्रमणिका'''

|❐ '''पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (तीन)

|❐ '''महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने'''- || (पाच)

|❐ '''चौथ्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (नऊ)

|❐ '''प्रथम आवृत्तीची प्रस्तावना''' || (बारा)

|❐ '''अध्यक्षांचे निवेदन''' || (एकवीस)

छायाचित्रे :-
''(१) महात्मा फुले (२) मराठी हस्ताक्षर (३) इंग्रजी हस्ताक्षर

(४) मोडी हस्ताक्षर, (५ ते १०) उईल पत्र

(११) चि. यशवंतासह म. फुले (१२) महात्मा फुले वाडा

|+ Caption text

| (१) नाटक : तृतीय रत्न (१८५५) || Example

| (२) पवाडा : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा (जून १८६९) || Example

| (३) पवाडा : विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून १८६९) || Example

| (४) ब्राह्मणांचे कसब (१८६९) || Example

| (५) गुलामगिरी (१८७३) || Example

| (६) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट (२० मार्च १८७७) || Example

| (७) सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक
समारंभाची हकिगत (२४ सप्टेंबर १८७६)

| (८) पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध
व वक्तृत्व समारंभ (१२ एप्रिल १८७७)

| (९) दुष्काळविषयक विनंतीपत्रक (२४ मे १८७७)

|(१०) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
(१९ ऑक्टोबर १८८२)

११९-२०१
२०३-२१३
२१५-२३०
२३१-२३४
२३५-२३७
२३९-२५४<noinclude></noinclude>
cl3g47a0jiwq8y8fnaj0ego7xcxxkrp
232650
232649
2026-06-25T06:43:46Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232650
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{|
|+ '''अनुक्रमणिका'''

|❐ '''पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (तीन)

|❐ '''महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने'''- || (पाच)

|❐ '''चौथ्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (नऊ)

|❐ '''प्रथम आवृत्तीची प्रस्तावना''' || (बारा)

|❐ '''अध्यक्षांचे निवेदन''' || (एकवीस)

छायाचित्रे :-
''(१) महात्मा फुले (२) मराठी हस्ताक्षर (३) इंग्रजी हस्ताक्षर

(४) मोडी हस्ताक्षर, (५ ते १०) उईल पत्र

(११) चि. यशवंतासह म. फुले (१२) महात्मा फुले वाडा

|+ Caption text

| (१) नाटक : तृतीय रत्न (१८५५) || १-३३

| (२) पवाडा : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा (जून १८६९) || ३५-८१

| (३) पवाडा : विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून १८६९) || ८३-९०

| (४) ब्राह्मणांचे कसब (१८६९) || Example

| (५) गुलामगिरी (१८७३) || Example

| (६) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट (२० मार्च १८७७) || Example

| (७) सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक
समारंभाची हकिगत (२४ सप्टेंबर १८७६)

| (८) पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध
व वक्तृत्व समारंभ (१२ एप्रिल १८७७)

| (९) दुष्काळविषयक विनंतीपत्रक (२४ मे १८७७)

|(१०) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
(१९ ऑक्टोबर १८८२)

११९-२०१
२०३-२१३
२१५-२३०
२३१-२३४
२३५-२३७
२३९-२५४<noinclude></noinclude>
kx88gdopttbup4teaw3554nd1i7shaz
232651
232650
2026-06-25T06:46:51Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232651
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{|
|+ '''अनुक्रमणिका'''

|❐ '''पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (तीन)

|❐ '''महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने'''- || (पाच)

|❐ '''चौथ्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (नऊ)

|❐ '''प्रथम आवृत्तीची प्रस्तावना''' || (बारा)

|❐ '''अध्यक्षांचे निवेदन''' || (एकवीस)

छायाचित्रे :-
''(१) महात्मा फुले (२) मराठी हस्ताक्षर (३) इंग्रजी हस्ताक्षर

(४) मोडी हस्ताक्षर, (५ ते १०) उईल पत्र

(११) चि. यशवंतासह म. फुले (१२) महात्मा फुले वाडा

|+ Caption text

| (१) नाटक : तृतीय रत्न (१८५५) || १-३३

| (२) पवाडा : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा (जून १८६९) || ३५-८१

| (३) पवाडा : विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून १८६९) || ८३-९०

| (४) ब्राह्मणांचे कसब (१८६९) || ९१-११८

| (५) गुलामगिरी (१८७३) || ११९-२०१

| (६) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट (२० मार्च १८७७) || २०३-२१३

| (७) सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक
समारंभाची हकिगत (२४ सप्टेंबर १८७६) || २१५-२३०

| (८) पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध
व वक्तृत्व समारंभ (१२ एप्रिल १८७७) || २३१-२३४

| (९) दुष्काळविषयक विनंतीपत्रक (२४ मे १८७७) || २३५-२३७

|(१०) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन
(१९ ऑक्टोबर १८८२) || २३९-२५४
|}<noinclude></noinclude>
bb8glo5sghk5fa6lh3kiatrpc1gxwuw
232652
232651
2026-06-25T06:48:05Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232652
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{|
|+ '''अनुक्रमणिका'''

|❐ '''पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (तीन)

|❐ '''महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने'''- || (पाच)

|❐ '''चौथ्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (नऊ)

|❐ '''प्रथम आवृत्तीची प्रस्तावना''' || (बारा)

|❐ '''अध्यक्षांचे निवेदन''' || (एकवीस)

छायाचित्रे :-
''(१) महात्मा फुले (२) मराठी हस्ताक्षर (३) इंग्रजी हस्ताक्षर

(४) मोडी हस्ताक्षर, (५ ते १०) उईल पत्र

(११) चि. यशवंतासह म. फुले (१२) महात्मा फुले वाडा

|+ Caption text

| (१) नाटक : तृतीय रत्न (१८५५) || १-३३

| (२) पवाडा : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा (जून १८६९) || ३५-८१

| (३) पवाडा : विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून १८६९) || ८३-९०

| (४) ब्राह्मणांचे कसब (१८६९) || ९१-११८

| (५) गुलामगिरी (१८७३) || ११९-२०१

| (६) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट (२० मार्च १८७७) || २०३-२१३

| (७) सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकिगत (२४ सप्टेंबर १८७६) || २१५-२३०

| (८) पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ (१२ एप्रिल १८७७) || २३१-२३४

| (९) दुष्काळविषयक विनंतीपत्रक (२४ मे १८७७) || २३५-२३७

|(१०) हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन (१९ ऑक्टोबर १८८२) || २३९-२५४
|}<noinclude></noinclude>
ikjoc7k5k8y8f4qk8xki6exr6p751ej
232653
232652
2026-06-25T06:48:52Z
QueerEcofeminist
918
/* Proofread */
232653
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="QueerEcofeminist" /></noinclude>{|
|+ '''अनुक्रमणिका'''

|❐ '''पाचव्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (तीन)

|❐ '''महात्मा फुले यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने'''- || (पाच)

|❐ '''चौथ्या आवृत्तीच्या संपादकांचे निवेदन''' || (नऊ)

|❐ '''प्रथम आवृत्तीची प्रस्तावना''' || (बारा)

|❐ '''अध्यक्षांचे निवेदन''' || (एकवीस)

छायाचित्रे :-
''(१) महात्मा फुले (२) मराठी हस्ताक्षर (३) इंग्रजी हस्ताक्षर

(४) मोडी हस्ताक्षर, (५ ते १०) उईल पत्र

(११) चि. यशवंतासह म. फुले (१२) महात्मा फुले वाडा

|+ Caption text

| (१) नाटक : तृतीय रत्न (१८५५) || १-३३

| (२) पवाडा : छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा (जून १८६९) || ३५-८१

| (३) पवाडा : विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी (जून १८६९) || ८३-९०

| (४) ब्राह्मणांचे कसब (१८६९) || ९१-११८

| (५) गुलामगिरी (१८७३) || ११९-२०१

| (६) पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट (२० मार्च १८७७) || २०३-२१३

| (७) सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकिगत (२४ सप्टेंबर १८७६) || २१५-२३०

| (८) पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ (१२ एप्रिल १८७७) || २३१-२३४

| (९) '''दुष्काळविषयक विनंतीपत्रक (२४ मे १८७७)''' || २३५-२३७

|(१०) '''हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन (१९ ऑक्टोबर १८८२)''' || २३९-२५४
|}<noinclude></noinclude>
p3mnf49l7hn8bzryf0dk8ogbrqdra2y
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/९
104
81357
232634
177094
2026-06-24T15:58:31Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232634
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''४'''|'''सज्जनगड व समर्थ रामदास.'''|}}
{{rule}}</noinclude>तांतडीने बरोबर चार वाजतां साताऱ्यास व तेथून सज्जनगडास पायगाडीनें जाण्यास निघालों.

{{gap}}सातारा हे शहर पुण्याच्या थेट दक्षिणेस आहे व साताऱ्याचे थेट दक्षिणेस कोल्हापुर आहे. पुण्याहून सातारा, कोल्हापुर व पुढे बेळगांव हा जुना रस्ता फारच रहदारीचा होता, व याच जुन्या रस्त्यावर सर्व मोठ-मोठीं गांवें वसलेलीं आहेत. सदर्न मराठा रेलवे ज्या मार्गानें नेली आहे तो स्वाभाविक व नैसर्गिक नाहीं. तो खर्च कमी करण्याकरितां व कृष्णा, वेण्या, कोयना वगैरे सह्याद्रिपर्वतांतून निघणाऱ्या नद्यांवरील वेगवेगळे पूल वांचविण्याच्या बुद्धीनें कांहींसा आडमार्गानें व आडरानांतून नेला आहे. मी तर असें ऐकिलें आहे कीं, ह्या रेलवेचा बेत चालला असतां पांच लाख रुपये दिल्यास कोल्हापुराहून आगगाडी नेऊ असें कोल्हापुर-दरबारला विचारण्यांत आलें होतें. पण कोल्हापुर-दरबारनें अदूरदृष्टीनें तें म्हणणें नाकबूल केलें. रेल्वे रस्ता मिरजेवरून गेला, व मग कोल्हापुर सरकारास मिरजपासून कोल्हापुरच्या फांट्याकरितां तीस लाख रुपये खर्च करावे लागले, हें सांगण्याचें कारण इतकेंच की हल्लीं रेलवेनें प्रवास करणाऱ्या माणसाला या जुन्या रस्त्याची माहिती नसते; पण पुण्याहून साताऱ्यास जाण्यास हाच रस्ता सरळ आहे.

{{gap}}पुणें हें मुळा-मुठा या नद्यांच्या कांठी असल्यामुळे एका प्रकारें दरींत वसलेलें आहे. त्यामुळे पुण्याहून पायगाडीनें जाणारास प्रथमतः बहुधा चढावाचा रस्ता चालावा लागतो. आम्हांला जावयाचें त्या बाजूला तर कातरजचा मोठा घाट होता. पुणे सोडून चार मैल आल्यावर शहराच्या सरहद्दीवर आंबील ओढा लागतो. रावबाजींच्या कारकार्दीत पर्वतीच्या खालीं रमण्यांत दक्षिणेला जमणाऱ्या भटभिक्षुकांची पुराने तुडुंब भरलेल्या याच ओढ्यांतून रात्री अपरात्रीं जातांना कशी फजिती होत असे, याच्या हरदासी कथा मीं ऐकल्या होत्या; त्यांची मला या वेळीं आठवण झाली. पांचपासून सहा मैलांपर्यंत एक मैलभर फार मोठा चढाव लागतो. ही एक लहानशी टेकड्यांची ओळच आहे. हा चढाव चढतांना फार जड जाते. मुख्य कातरजचा डोंगर व या टेकड्या यांचे दरम्यानचे दरीतच<noinclude></noinclude>
kjz2wllsu65ybw6aro3h0oh4y2k9ur4
पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१०
104
81361
232635
177098
2026-06-24T16:01:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
232635
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||'''सज्जनगड व समर्थ रामदास.'''|५}}
{{rule}}</noinclude>जुना पेशव्यांचा कातरजचा तलाव आहे; व तेथून पुण्यांत पाणी आणिलें आहे. सहा मैलांपासून ८ मैलांपर्यंत म्हणण्यासारखा चढाव नाहीं. आठ मैलांपासून अकरा मैलांपर्यंत मात्र सारखा घाटाचा चढाव आहे व कांहीं ठिकाणीं तर तो बराच कठीण आहे. नवव्या मैलाच्या जवळ आम्ही कसेबसे आलों, व तेथून वर चढण्यास एक पाऊलवाट आहे व तिनें गेल्यास एक मैलाचा हिसका वांचतो, हें मला ठाऊक होतें म्हणून आम्ही पायगाड्या हातांत घेऊन ती पाऊलवाट पायीं चाललों. असें करतांना आपलेच वाहन आपल्या खांद्यावर घेण्याचा केव्हां केव्हां प्रसंग येतो; तसा आमच्यावरही आला. हा कातरजचा सर्व घाट उत्तम बांधलेला आहे व यंदा पाऊस खूप पडल्यामुळें जिकडेतिकडे हिरवीगार झाडे व शेतें दृग्गोचर होत होतीं. यामुळे सभोवारचा देखावा दृष्टिमनोहर दिसत होता. १० मैलांपर्यंत आम्ही पायी चाललों, तोंच घाटांतल्या सर्वात उंच टेकडींत असलेला बोगदा दिसूं लागला. येथपासून एक मैल चढाव आहे; पण फार बेताचा आहे. शेवटीं एकदाचे आम्ही बोगद्याशीं आलों; परंतु सर्व घाटाचा चढाव चढून आल्यामुळे फार दम लागला व तहानही फार लागली, म्हणून तेथें असलेल्या पब्लिक वर्कसच्या स्टोअरमध्ये गेलों व तेथील कारकुनाजवळ पाणी मागितले. त्याने बोगद्यांतील टाक्याचें स्वच्छ व गार पाणी आणून दिलें व तें आम्हीं यथेच्छ प्यायलों. या जलपानाने आमचा थकवा पार नाहींसा झाला व आह्मांला पुढे जाण्यास हुरुप व हुशारी आली. आतां आमच्या आजच्या पुढच्या प्रवासांतील पुष्कळ भाग उताराचा व निवळ सपाटीचा होता. यामुळेही मनाला आनंद होत होता. परंतु घड्याळांत पाहतां सहा वाजले. ह्मणजे या दोन तासात आमचा प्रवास ताशीं सहा मैलच पडला व पुढे तर रात्रीपर्यंत आह्मांला आणखी वीसएकवीस मैल जावयाचें होतें, ह्मणून आह्मी पायगाडीवर पाय टाकला व बोगद्यांतून जाऊं लागलों. हा बोगदा जवळजवळ दोन फरलांगांचा आहे. याच्यामध्ये रात्रीचे दिवे लावतात. बोगद्याच्या या टोकापासून दुसऱ्या टोकाचा उजेड दिसतो. पण बोगद्याच्या मध्ये अगदी अंधार असतो व पायगाडीच्या खालींवर<noinclude></noinclude>
lkppqs6kcs4e9awuoyj0skj8eug83bw
अनुक्रमणिका:काशी-रामेश्वर यात्रा.pdf
106
104084
232641
232432
2026-06-24T16:28:28Z
कल्पनाशक्ती
3813
232641
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 34="मदुरा" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 51="कोडैकनाल" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो" 107="दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला" 113="फोटो" 114="फोटो" 123="जबलपूर" 125="फोटो" 126="फोटो" 129="फोटो" 130="फोटो" 133="फोटो" 134="फोटो" />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
5v69jpvqc57gqukzbdt4vi7xlg8sm1y
232666
232641
2026-06-25T11:30:55Z
कल्पनाशक्ती
3813
232666
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=काशी-रामेश्वर यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=पुणे
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 3="फोटो" 5="प्रस्तावना" 8="अनुक्रमणिका" 10="नकाशा" 12="यात्रामार्ग व यात्राकाल" 17="रामेश्वर व सेतुरामेश्वर" 28 ="फोटो" 29="फोटो" 34="मदुरा" 42 ="फोटो" 43="फोटो" 46="फोटो" 51="कोडैकनाल" 55="फोटो" 56="फोटो" 65="फोटो" 66="फोटो" 69="डिंडिंगल आणि पालघाट" 87="फोटो" 88="फोटो" 95="फोटो" 96="फोटो" 107="दक्षिण-काशी : श्रवणबेलगोला" 113="फोटो" 114="फोटो" 123="जबलपूर" 125="फोटो" 126="फोटो" 129="फोटो" 130="फोटो" 133="फोटो" 134="फोटो" />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
35m621aj12ob6w6gm9dsj9ac4wb0uq6
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/४५
104
110816
232636
2026-06-24T16:13:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232636
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>गेलों ते नाताळच्या सुट्टीचे दिवस असल्यामुळे दुसऱ्या मजल्याच्या जिन्याला कुलूप होते व त्याची किल्ली शिपायाजवळ नसल्यामुळे आम्हांला मजल्यावरील गच्चीवर जातां आलें नाहीं. हा राजवाडा पूर्वी बराच मोठा होता. पण त्याचे पुष्कळ भाग निरुपयोगी म्हणून म्हणा किंवा पडावयास झाले होते म्हणून म्हणा जमीनदोस्त करण्यांत आले असें मला कळलें. पण शिल्लक भागावरून सुद्धां हा तिरुमल नाईकाचा अवशिष्ट राजवाडा मदुरा शहराचा एक बहुमोल अलंकार आहे असें पहाणारास वाटल्यावांचून रहात नाहीं.
{{gap}}मदुरेच्या अपूर्व प्रेक्षणीय स्थळांपैकी तिसरें स्थळ म्हणजे शहराच्या दक्षिणेस तीन मैलांवर असलेला व तिरुमल नाईकानेंच बांधलेला तलाव होय. या तलावाला एका मार्गदर्शकास घेऊन अगदी उजाडत मी चालत गेलों. कारण रिक्शाचा उपयोग केव्हांही करायचा नाहीं असें मी मनाशी ठरविलें होतें. हा रस्ता प्रशस्त असून दाट वस्तीचा शहराचा भाग टाकला म्हणजे रस्त्याचे दोन्ही बाजूस नारळी-पोफळीच्या रायाच राया लागतात व या सुंदर रायांमध्यें मधून मधून बंगले लागतात. तो तांबड्या मातीचा गुळगुळीत व तकाकणारा रस्ता सभोवार हिरव्यागार झाडांच्या राया व मंगलोरी कवलारू ते बंगले हा देखावा मनोहर वाटतो. या रस्त्याने जातांना डाव्या हातास मोठे भव्य लोखंडी नक्षीदार फाटक असलेली व पुढे सुंदर बाग असलेली सौराष्ट्र हायस्कूल नांवाची इंग्रजी शाळा लागली. कोठें दक्षिण हिंदुस्थानांतील मदुरा शहर व कोठें मुंबई इलाख्याच्या उत्तर भागांतील काठेवाड! हा विरोध सौराष्ट्र हें नांव पाहून माझ्या मनांत आला. या शाळेची इमारत तांबूस दगडाची असून नवीच बांधलेली दिसली. मार्गदर्शकानें सांगितलें कीं, मदुरेस फार जुन्या काळापासून काठेवाडी गुजराती लोक येऊन स्थाईक झालेले आहेत व त्यांच्यामधील धनिक लोकांच्या मदतीनें ही मोठी टोलेजंग सुंदर इमारत नुकतीच बांधण्यांत आली आहे. सुमारें एक तास चालल्यावर मदुरेचा प्रख्यात तलाव आला. हा तलाव<noinclude></noinclude>
jpwg1s31q97acbeqycfm7zsmpzway7v
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/४७
104
110817
232637
2026-06-24T16:16:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232637
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मदुरा|३१ }}</noinclude>बराच मोठा असून तो बरोबर चौकोनी आहे. त्याच्या चारी बाजू तांबड्या दगडांनी बांधलेल्या असून त्याच्या सभोवार दोन अडीच फूट उंचीचा दगडी नक्षीदार कठडा बांधलेला आहे. तलावाच्या प्रत्येक बाजूस तीन घाट- मधला जरा मोठा व बाजूचे जरा लहान- बांधले आहेत. घाटाचे बाजूच्या कठड्याचे कोपऱ्यावर नंदीच्या हुबेहूब घडलेल्या मूर्ति बसविल्या आहेत. तलावाच्या चार कोपऱ्यांपैकी दोन कोपऱ्यांना सुंदर मंडप उभारलेले आहेत. तलावाची प्रमाणबद्धता व एकंदर सुबक रचना पाहून योजकाच्या कल्पनेबद्दल व सदभिरुचीबद्दल विलक्षण कौतुक वाटलें. पण या सुंदर तलावाचे अपूर्वत्व येथेंच थांबत नाहीं. या तलावाचे बरोबर मध्यावर एक छोटे बेट बनविलें आहे. तें बेटही तलावाप्रमाणे बरोबर चौकोनी चौरस असून तलावाप्रमाणेच त्याच्या चारी बाजू तांबड्या दगडांनी सारख्या बांधून काढलेल्या आहेत व त्याच्या चारी बाजूस जिन्यावजा चार पांच पायऱ्या केल्या आहेत. बेटाचे चारी कोपऱ्यास सुंदर छोटे मनोरे बांधले असून खाली हवा खाण्यास बसण्याची सोय केलेली आहे. बेटाचा मधला मनोरा तर पांच सहा मजले उंच असून त्यावर जाण्यास दोन मजल्यास भिंतींतील जिने व बाकी मजल्यावर चढण्यास लाकडी शिड्या आहेत. अर्थात् तलावाच्या घाटावरून मधल्या बेटावर नेण्यास तेथें होडीवाले नेहमी हजर असतात. ते माणशी सहा पैसे भाडे घेतात. आम्ही होडींतून त्या बेटावर गेलों. त्या बेटावरील बांधकाम व मधल्या इमारतीचे हिंदूंच्या शिखराप्रमाणे नक्षीदार केलेले काम व पांचव्या मजल्यावर चढून तेथून दिसणारा सभोवारचा देखावा हा सर्वच अपूर्व आहे यांत शंका नाहीं. या तलावाचें पाणी काळसर हिरवट आहे. तो मधला पांढऱ्या रंगाचा शिखरवजा मनोरा, ते चारी बाजूचे एकमजली शुभ्र मनोरे, सभोवारचें ते काळसर हिरवें पाणी व तलावाच्या सभोवारचा तांबड्या दगडाचा तो नक्षीदार कठडा व त्याचे पलीकडे दिसणारा हिरवा हिरवागार भूमिभाग व नारळी-पोफळीच्या बागा हा<noinclude></noinclude>
9ml85q9o1x04gc8xdfbw4fcj9ygn6xu
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/४८
104
110818
232638
2026-06-24T16:21:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232638
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>सर्व देखावा मनोऱ्याच्या माथ्यावरून पाहिला म्हणजे तिरुमल नाईकांच्या कल्पकतेचें, त्याच्या सदभिरुचीचे, त्याच्या वैभवाचें व संपन्नतेच राहून राहून आश्चर्य वाटे. याप्रमाणें आश्चर्यचकित मनानें मी त्या देखाव्याकडे किती तरी वेळ पहात होतों. पण परत जाण्यास व विशेषतः चालत जावयाचे असल्यामुळे बराच वेळ लागणार हे मनांत आणून मी मनोऱ्याच्या खाली आलों व मग होडींतून काठावर आलो. होडींत असतांना मला जीनिव्हा येथील रूसो बेटाची आठवण झाली. मनोऱ्याच्या रचनेमुळे हे बेट त्या बेटापेक्षां जास्त रमणीय झालें आहे असें मला वाटलें. मदुरेच्या प्रेक्षणीय स्थळांच्या त्रयीचें वर्णन सरलें.
{{gap}}आतां आसपासच्या निसर्गरमणीय देखाव्याचें वर्णन करून मदुरेची रजा घेतों. मी मदुरेंत तीन दिवस होतों. एक दिवस सायंकाळीं मी मदूरेहून मद्रासेस जाणाऱ्या उत्तर दिशेच्या रस्त्याने फिरावयास गेलों. मदुरा शहर वैगै नदीच्या कांठीं आहे व पुण्याच्याप्रमाणे ती नदी मदुरेच्या उत्तरेसच आहे. मी सरळ त्या दिशेने गेलों तो भला थोरला रेल्वे पूल लागला व बाजूला पायउतार रस्ता लागला. नदींत पाणी पाऊलभरच होते; पण नदी बरीच रुंद व वाळूने भरलेली आहे; वाळूत माती नसल्यानें पाय चिखलानें मुळींच भरत नाहींत. नदीचा देखावा सुंदर दिसतो. ती रुंद पात्राची, उथळ पण स्वच्छ वाळूची नदी, तिचें झुळझुळ वाहणारें स्वच्छ पाणी, डाव्या हातास तो रेल्वेचा लोखंडी पूल, उजवे हातास बऱ्याच अंतरावर दिसणारा तो तांबडा विटांच्या कमानींचा भव्य पूल हा देखावा नयन-मनोहर आहे. नदीपार होऊन मी अर्थात् गाडीपुलाचे बाजूला वळलों तोंच मद्रासेस जाणाऱ्या रस्त्याचे मैलाचे दगड दिसले. हा रस्ता नदीला थेट खेटून गेला आहे. सभोंवार हिरवी हिरवीगार भातशेतें दिसत होतीं व नदीच्या पलीकडच्या काठाला नारळीची दाट झाडी दिसत होती. नदीच्या पलीकडे वस्ती आहे पण ती तुरळक आहे. या वाटेनें जातांना डाव्या हातास एक थेट हत्तीच्या आकाराचा हत्तीच्या काळसर<noinclude></noinclude>
scp5mkiynztunl4d4be6dfeap3674q8
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/४९
104
110819
232639
2026-06-24T16:25:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232639
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मदुरा|३३ }}</noinclude>कबऱ्या रंगाचा निर्वृक्ष असा खडक दुरून दिसतो. तो देखावा मोठा विस्मयजनक वाटतो खरा! नंतर मी पुलानजीक आलों तोंच मला नव्या नव्या सुंदर इमारती दिसल्या व त्याच्याहीपेक्षां आवारांत अधिक सुंदर व रमणीय रचनेची बाग दिसली. प्रवेशद्वाराशीं 'अमेरिकन मिशन कॉलेज' अशी पाटी पाहिली तेव्हां मी सहजच आंत शिरलों. प्रवेशद्वारापासून दुतर्फा झाडे असलेला तांबडा तांबडा रस्ता रमणीय आहे. प्रथम कॉलेजची इमारत लागली, मग कॉलेजचें नवेंच चॅपेल लागलें. पुढे बरेच प्रोफेसर लोकांचे बंगले लागले व शेवटीं कॉलेजचें वसतिगृह लागलें. नंतर नदीकडे वळण घेऊन जाणारा रस्ता लागला. येथपर्यंत मी सभोवारची शोभा पहात पहात गेलों. परत येतांना टेनीसकोर्टाशी थांबलों व टेनीसचा खेळ चालू होता म्हणून मी तेथें रेंगाळलों तो बाकावर बसलेल्या गृहस्थानें मला बोलवल्यामुळे मी आंत जाऊन खेळ पहात बसलों. सुदैवानें बाकावर बसलेले गृहस्थ प्रोफेसर वर्गापैकींच होते. यामुळे मला सहजच कॉलेजची माहिती मिळाली. खेळ संपल्यावर त्या गृहस्थान मला कॉलेजांतील इंग्रजीच्या प्रोफेसरांची ओळख करून दिली. मग आम्ही बोलत बोलत परतलों व कॉलेजच्या इमारती बाहेरून ओझरत्या पाहिल्या. नंतर मी त्या गाडीरस्त्याच्या पुलानें परत छत्राला आलों. या सहलीने मला मदुरा शहराचा नदीपलीकडील भाग पहाण्यास सांपडला. पुण्याप्रमाणेच इकडे गेल्या दहा बारा वर्षांत नवीं घरें व नवी वस्ती वाढत आहे असें दिसलें. दुसरे दिवशीं सकाळीं मी दक्षिण दिशेच्या रस्त्यानें खूप लांबवर फिरावयास गेलों. ही सहलही मोठी मजेदार वाटली. इकडचा भूमिभाग सपाटच सपाट आहे. तीन मैलांच्या सहलींत किती तरी लहान मोठे तलाव व कालवे लागले. यावरून इकडे पाण्याची किती विलक्षण विपुलता आहे हें पाहून सांगलीसारख्या दुर्जल प्रदेशांत कांही काळ घालविलेल्या मला विलक्षण आनंद व मौज वाटली हें सांगणें नकोच. या रस्त्यानें दूरवर गेलें म्हणजे एक लहान टेकड्यांची ओळ<noinclude>
{{gap}}३</noinclude>
0fftfc0tg98690thfn6jig5epf5gefg
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५०
104
110820
232640
2026-06-24T16:27:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232640
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>लागते. अलीकडच्या टेकडीच्या टोकावर ख्रिश्चन मिशनऱ्याचा एक बंगला आहे. हे त्या टेकडीकडे वळणाऱ्या पण 'खासगी रस्ता' अशी पाटी असलेल्या रस्त्यानें दर्शविलें; टेकडीच्या दुसऱ्या टोकाच्या माथ्यावर मुसलमानी मशीद व पायथ्याशीं एक हिंदु देवालय आहे असें कळले. पण सहलीची मजल तीन मैलांवर झाली म्हणून आणखी पुढे न जातां त्या इमारतीच्या दुरून दिसणाऱ्या ओझरत्या दर्शनानें मनाचें समाधान करून मी परत छत्राला आलों. माझें मदुरापुराण संपलें.
{{gap}}दुसरे दिवशीं सकाळींच मी कोडैकनाल या शतिल निवासस्थानास जाण्याकरितां आगगाडी गांठली.

{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
ispmi3xsuk0rkvnp62a6iujpqoibu17
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५१
104
110821
232642
2026-06-24T16:33:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232642
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ४ थें.'''}}}}
{{rule|7em}}
{{center|'''कोडैकनाल'''}}
{{gap}}{{x-larger|'''नि'''}}निवळ नांवावरून ऐकीव माहितीने झालेल्या कल्पनेवरून मनाची कशी फसगत होते, पण त्यामुळे प्रवासाचा आनंद कसा दुणावतो याचा अनुभव मला '''कोडैकनाल'''च्या दृश्यदर्शनानें आणून दिला. नीलगिरी पर्वताचे दक्षिणेस जो सपाट, सुपीक, सुजल प्रदेश आहे त्यामध्यें कोडैकनाल नांवाचें शीतल निवासस्थान आहे असें मला ऐकून ठाऊक होतें. तेव्हां ज्याप्रमाणे मुंबईच्या नजीक माथेरान आहे त्याप्रमाणें छोटेसें व समुद्रापासून दोन अडीच हजार फूट उंचीचें तें निवासस्थान असेल व या पहाडांत विपुल पाणी असून एखादा छोटासा नैसर्गिक पाट (कनाल) या निवासस्थानी असेल व म्हणून याला कोडैकनाल असें अन्वर्थक नांव मिळाले असेल अशी माझी कल्पना व समजूत झाली होती. ही कल्पना व समजूत अनुभवानें चुकीची ठरली. खरोखरीं तें शीतल निवासस्थान निसर्गरमणीय पण विलक्षण उंचीच्या व मन थक्क करणाऱ्या पर्वतराजीवर वसलेलें असून तेथे पाण्याची महर्गता आहे असें मला प्रत्यक्ष पाहिल्यावरून कळून आलें. कल्पना व सत्य यांतील या विरोधामुळे मला हे शीतल निवासस्थान पाहून विलक्षण आश्चर्य व आनंद वाटला. असो.
{{gap}}मागे सांगितल्याप्रमाणें मदुरेहून कोडैकनाल स्टेशनला जाण्यास मी सात वाजतांच्या आगगाडीनें निघालों. मदुरेपासून कोडैकनाल स्टेशन सुमारें पंचवीस मैल आहे. सेकंड क्लास भाडें एक रुपया तीन आणे पडलें. स्टेशनवर कोडैकनालला जाणारी मोटारबस उभी होती. स्टेशनपासून कोडैकनाल शीतल निवासस्थल पन्नास मैल दूर आहे. भाडे तीन रुपये xडले. मोटारींत माझ्यासारखे कोडैकनाल पाहण्यास आलेले एक गृहस्थ<noinclude></noinclude>
sh012usa6e2r1lpkn1f8eq5ak6v25eu
232643
232642
2026-06-24T16:33:46Z
कल्पनाशक्ती
3813
232643
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ४ थें.'''}}}}
{{rule|7em}}
{{center|'''कोडैकनाल'''}}
{{gap}}{{x-larger|'''नि'''}}वळ नांवावरून ऐकीव माहितीने झालेल्या कल्पनेवरून मनाची कशी फसगत होते, पण त्यामुळे प्रवासाचा आनंद कसा दुणावतो याचा अनुभव मला '''कोडैकनाल'''च्या दृश्यदर्शनानें आणून दिला. नीलगिरी पर्वताचे दक्षिणेस जो सपाट, सुपीक, सुजल प्रदेश आहे त्यामध्यें कोडैकनाल नांवाचें शीतल निवासस्थान आहे असें मला ऐकून ठाऊक होतें. तेव्हां ज्याप्रमाणे मुंबईच्या नजीक माथेरान आहे त्याप्रमाणें छोटेसें व समुद्रापासून दोन अडीच हजार फूट उंचीचें तें निवासस्थान असेल व या पहाडांत विपुल पाणी असून एखादा छोटासा नैसर्गिक पाट (कनाल) या निवासस्थानी असेल व म्हणून याला कोडैकनाल असें अन्वर्थक नांव मिळाले असेल अशी माझी कल्पना व समजूत झाली होती. ही कल्पना व समजूत अनुभवानें चुकीची ठरली. खरोखरीं तें शीतल निवासस्थान निसर्गरमणीय पण विलक्षण उंचीच्या व मन थक्क करणाऱ्या पर्वतराजीवर वसलेलें असून तेथे पाण्याची महर्गता आहे असें मला प्रत्यक्ष पाहिल्यावरून कळून आलें. कल्पना व सत्य यांतील या विरोधामुळे मला हे शीतल निवासस्थान पाहून विलक्षण आश्चर्य व आनंद वाटला. असो.
{{gap}}मागे सांगितल्याप्रमाणें मदुरेहून कोडैकनाल स्टेशनला जाण्यास मी सात वाजतांच्या आगगाडीनें निघालों. मदुरेपासून कोडैकनाल स्टेशन सुमारें पंचवीस मैल आहे. सेकंड क्लास भाडें एक रुपया तीन आणे पडलें. स्टेशनवर कोडैकनालला जाणारी मोटारबस उभी होती. स्टेशनपासून कोडैकनाल शीतल निवासस्थल पन्नास मैल दूर आहे. भाडे तीन रुपये xडले. मोटारींत माझ्यासारखे कोडैकनाल पाहण्यास आलेले एक गृहस्थ<noinclude></noinclude>
hdk82og90fibogwmc344twe1bwwgxs4
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५२
104
110822
232644
2026-06-24T16:37:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232644
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>भेटले. ते सिरियन ख्रिश्चन जातीचे असून मद्रासचे एंजिनीयरिंग पदवीधर असून '''मेटुर''' बंधाऱ्याच्या कामावर आहेत व त्यांचें नांव मिस्टर जॉन आहे असं मोटारींतील संभाषणाने मला समजून आलें. प्रवासप्रिय असे हे समानशील गृहस्थ भेटल्यामुळे आमचा सुमारे तीन दिव सांचा सहवास व सहदृश्यदर्शन फारच सुखाचें व आनंदाचं झालें.
{{gap}}या आकस्मिक मित्रलाभानें मला "यथाकाष्ठंच काष्ठंच समेयातां महोदधौ । समेत्य च व्यपेयातां तद्वद्भूतसमागमः ॥" या सुभाषिताची आठवण झाली. मात्र अर्वाचीन काळी आमचा समागम मोठ्या समुद्रांत न होतां मोटारबसच्या वाहत्या गंगेत व गिरिशिखरावर झाला व तो मोठा चिरस्मरणीय झाला. म्हणूनच कोडैकनालच्या दृश्यवर्णनांत मीं एकवचनी उल्लेख न करितां अनेकवचनी केला आहे. आमचा सुमारें वीस मैल रस्ता सपाट प्रदेशांतून होता. या भागांत पाण्याची व पाटाची विलक्षण विपुलता दिसली. माझ्या एंजिनीयर मित्रानें माहिती दिली कीं, या भागांत व सबंध मदुरा जिल्ह्यांत लहान मोठे तलाव होतेच; पण हल्ली त्यामध्यें '''पेरियार''' नदीच्या प्रचंड धरणाच्या कामामुळे पाणीपुरवठ्याच्या बाबतींत पुष्कळच भर पडली आहे; ही जमीन सुपीक असल्यामुळे हल्लीं या भागांत भाताचीं तीन पिके काढतात. याचे प्रत्यक्ष प्रमाणही मला तत्काळ मिळाले. या भागांत भाताच्या पिकांच्या तिन्ही अवस्था मला पहावयास सांपडल्या. आपल्या प्रांतांत हा देखावा दुर्मिळ. कांहीं भाताची शेतें अगदीं कापावयास तयार झालीं होतीं; कांहीं दोन महिन्यांनी तयार होण्याच्या स्थितींत होतीं तर कांहीं शेतांत नांगर चालत असून भाताची नवी लावणी चालू होती. ही पाटबंधाऱ्यानें आणलेली सुबत्ता प्रत्यक्ष पाहून मला आमच्या कोंकणाच्या एका वर्षांत एक एकच पीक जेमतेम देणाऱ्या दुर्भिक्षतेची आणि दीडशे इंच पाऊस पडत असूनसुद्धां पाण्याच्या टंचाईची आठवण झाली. मद्रास सरकार व मुंबई सरकार यांच्या लोककल्याणाच्या बाबतींतील कृति विरोध मनांत येऊन माझें मन जरा खिन्न झालें. अर्थात् येथली सुबत्ता<noinclude></noinclude>
fabgm71xtxzi54z7ofz39cvz91b83vd
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५३
104
110823
232645
2026-06-24T16:40:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232645
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोडैकनाल|३७ }}</noinclude>पाहून आनंद वाटला हें सांगावयास नकोच. असे मिश्र मनोविकार मनांत येत आहेत तोंच आम्हीं '''पालनी''' पर्वतराजी- (ज्या पर्वतराजीच्या पूर्व बाजूच्या शिखरावर कोडैकनाल गिरिनिवासस्थल वसविलेलें आहे) नजीक आलों. ती पर्वतराजी जिकडे तिकडे रानानें व गर्द झाडीनें हिरवी हिरवीगार दिसत होती. मात्र डाव्या बाजूच्या फारच उंच शिखराचा कांहीं भाग उघडा व तुरळक गवताचा दिसला. त्या शिखरावरच आम्हाला चढावयाचें होतें. तें आकाशाला भेदून जाणारें शिखर पाहून कोडैकनालच्या नांवावरून व ऐकिव माहितीवरून बनलेल्या माझ्या कल्पना पार नाहींशा झाल्या व केवढ्या उंच गिरिशिखरावर कोडैकनाल वसविलें आहे हें मनांत येऊन मी आश्चर्यचकित झालों. प्रत्यक्ष गिरिशिखरावर चढतांना व तेथें पोहोंचल्यावर तर तें पहिलें आश्चर्य द्विगुणित त्रिगुणित नव्हे दशगुणित झालें हें खालील वर्णनावरून समजून येईल. आमची मोटार भराभर '''पालनी''' पर्वताचा घाट चढू लागली. या घाटाचा पहिला दहा मैलांचा टप्पा थेट महाड-महाबळेश्वर घाटासारखा आहे. ज्याप्रमाणें तो रस्ता प्रतापगड किल्ल्याच्या पर्वताला जणूं कांहीं प्रदक्षिणा करीत विलक्षण वळणा-वळणानें जातो त्याप्रमाणें हा रस्ता एका पर्वत शिखराला वळसा घालीत घालीत वर वर जात होता. महाड-महाबळेश्वर रस्ता प्रतापगडाच्या पायथ्याशीं आल्यावर कोयना नदीच्या विस्तृत अशा खोऱ्यांत येतो व पुढे फक्त महाबळेश्वरचा एकच डोंगर चढावयाचा राहातो; तो दहा मैलांचा दुसरा घाट चढला म्हणजे मनुष्य महाबळेश्वराच्या मोठ्या सपाट पठारावर येतो. पण कोडैकनालच्या रस्त्याची रचना कांहीं विलक्षणच आहे. पहिले दहा मैल चढल्यावर अत्यंत चिंचोळ्या अशा दरींत रस्ता येतो व मग डोंगरांची व दऱ्यांची अशी खिचडी व खेचाखेच झालेली दिसते कीं, आपण कोठें आहों, आपल्याला कोठें जावयाचें आहे व कसें जावयाचें हें कळेनासें होतें. उत्तम केलेली सडक असल्यामुळें तीच काय ती एक मार्गदर्शक सेविका वाटते. पण मौज ही कीं, हे सर्व डोंगर लागवडीस आणलेले आहेत. ज्याप्रमाणें आपल्या इकडल्या डोंगरउतारावर नाचणी व वरीचीं पिके<noinclude></noinclude>
o7riobg9lsx3qlpru3thi6nkvtltny1
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५४
104
110824
232646
2026-06-24T16:44:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232646
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>दिसतात, तशी येथल्या डोंगरउतारावर व मधल्या दऱ्या-खोऱ्यांमधून केळीची पिकेच पिके दिसतात. केळींना पाणी फार लागतें व त्या खोल जागेवांचून होत नाहींत ही आपली समजूत येथल्या केळीच्या झाडांची रानेच रानें पाहून पार नाहींशी होते. किती विलक्षण आश्चर्यकारक हा देखावा वाटतो. कोडैनकनाल येथें पोहोंचण्यास आम्हांला या अशा निबिड अरण्याच्या व चक्रव्यूहासारख्या रस्त्यानें वीस मैल जावें लागलें. हा पालनी घाट महाड-महाबळेश्वर घाटापेक्षां दहा मैलानें अधिक मोठा आहे. म्हणजे हा एकंदर तीस मैलांचा घाट आहे. मोटारींतून या घाटानें वर चढतांना तळांतील उष्ण हवा व घाटमाथ्यावरील शीतल हवा यांतला फरक आश्चर्यकारक वाटतो. कोडैकनालच्या घाटानें पंचवीस मैल आल्यावर कोडैकनालच्या अद्वितीय दृश्यदर्शनाचे जणूं कांहीं पूर्वचिन्ह असा सिलव्हर फॉल नांवाचा धबधबा लागतो. हा धबधबा नांवाप्रमाणे रुपेरी रंगाचा आहे. काळ्या भोर खडकावरून शुभ्रवर्ण असा हा पाण्याचा प्रवाह घो घो शब्द करीत शंभर दीडशे फुटांवरून रस्त्याला असलेल्या पुलाशींच पडतो. सध्यां उन्हाळा असल्यामुळे पाण्याचा प्रवाह लहान होता खरा, तरी पण कोडैकनालचे हे दृश्य पांच मैल चालत येऊन पहाण्यासारखें प्रेक्षणीय स्थळ आहे यांत शंका नाहीं. मात्र हल्लीं मोटारीने प्रवास करतांना हें जातां येतां आपोआप बिनखर्च व बिनश्रम दृष्टीस पडतें. अर्थात् दोन दिवसांच्या कोडैकनाल यात्रेकरूंना हे स्थळ पहाण्यास मुद्दाम पायीं किंवा मोटारनें येण्याचे कारण पडत नाहीं. म्हणून कोडैकनालच्या सृष्टिसुंदरीनें दिलेला हा अपूर्व प्रसादच वाटतो. हे कोडैकनालचें पहिलें प्रसादचिन्हरूप दृश्य पाहून त्याचें मनोमय चित्र हृदयफलकावर स्थिर करतों न करतों तोंच आम्हीं कोडैकनालच्या प्रवाशांच्या विश्रांति गृहास (rest house) येऊन पोहोंचलों. आतां साडेबारा वाजले होते तरी पण हवेंत विलक्षण गारवा होता. दोन प्रहरचा फराळ झाल्याबरोबर आम्हीं आमच्या दृश्यदर्शनास निघालों.{{nop}}<noinclude></noinclude>
bbiyfsvxf51xptx1o7azt7li6zcdmij
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५७
104
110825
232647
2026-06-24T16:48:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232647
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोडैकनाल|३९ }}</noinclude>{{gap}}आमच्या विश्रांतिगृहाचे किंचित् वर उंचवट्यावर पांढऱ्याशुभ्र रंगाचें क्रिश्चन प्रार्थना मंदिर होतें. तें आम्हीं दुरूनच देखलें. विश्रांतिगृह व प्रार्थनामंदिर हीं एका छोट्या टेकडीवर बांधलेलीं आहेत. ती टेकडी पांच हजार फूट उंच असलेल्या दरीमध्ये पाचरेसारखी घुसली आहे. येथून कोडैकनालच्या चढत्या बसलेल्या बाजारकडे वाट जाते. ही वाट छातीफोड उंचीची आहे. व त्यावर बाजारची घरें एकावर एक अशीं दुतर्फा लागलेलीं आहेत. बाजार सरतो तेथें पोस्ट कचेरी लागते. पण ती कचेरी विश्रांतिगृहापासून दीडशें दोनशें फूट उंच आहे. या पोस्ट कचेरीपासून कोडैकनाल निवासस्थानचा समोरचा तेवढा भाग दिसतो. कारण या निवासस्थानाला कोठें सपाट पठारासारखा भूमिभाग नाहीं. सर्व शीतलनिवासस्थान सरासरी सहाहजार फूट उंचीच्या वर असलेल्या टेकड्यां-टेकड्यांच्या माथ्यावर व उतारावर बसलेलें आहे. यामुळे गांवांत कोठेही सपाट सरळ रस्ता नाहीं. सारखा चढउताराचा व वांकडा तिकडा रस्ता लागतो. यामुळें येथें निराळा व्यायाम घेण्याची मुळींच जरूरी नाहीं. बाजारांतून बंगल्यावर व एका बंगल्याहून दुसऱ्या बंगल्यावर जातां येतांच धापा टाकण्यास लावणारा व्यायाम आपोआप होतो. अशी विलक्षण या गिरिनिवासस्थानाची रचना आहे. पण हवा थेट विलायतच्या हवेप्रमाणे असल्यामुळे या चढउताराच्या सहलीनें थकवा वाटत नाहीं.
{{gap}}पोस्टाजवळून दिसणारा सुंदर देखावा पाहून जे आम्ही निघालों ते कोडैकनलचें पहिलें प्रेक्षणीय स्थळ- सुंदर सरोवर- पहाण्यास गेलो. पोस्टऑफिसच्या पुष्कळच खालीं हे सरोवर आहे. उंच उंच व गर्द छायेच्या वृक्षराजींनी तें सरोवर वेष्टिले असल्यामुळे तें दुरून दिसत नाहीं. जेव्हां सरोवराला लागून असलेल्या सहलवाटेशीं यावें तेव्हां तें सरोवर दृग्गोचर होतें. हे सरोवर हा कोडैकनालचा एक आश्चर्यकारक अलंकार आहे यांत शंका नाहीं. उंच उंच वृक्षवेलींनीं व नानारंगी फुलझाडांनी शोभायमान झालेल्या टेकड्यांनी या सरोवराची तटबंदीच केली आहे. जणूं कांहीं<noinclude></noinclude>
mh9nn9o9qpuvp0rc8uxbjiep7019xzf
सदस्य चर्चा:Dhanashri Pujari
3
110826
232648
2026-06-24T19:19:25Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
232648
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Dhanashri Pujari}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ००:४९, २५ जून २०२६ (IST)
3hw8kbgen4c7t7m6jxpuwe5z8tcmy1p
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५८
104
110827
232657
2026-06-25T11:00:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232657
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>कोडैकनालच्या सृष्टिसुंदरीने आपला हा अद्वितीय दागिना पर्वत पेटींत लपवून ठेविला आहे. या सरोवराचा आकार वर्तुळाकार, लांबवर्तुळाकार किंवा चौकोनी या नेहेमींच्या सरोवराच्या आकारांपैकीं नाहीं. याचा आकार विलक्षण आहे. हातपाय ताणून पाठ खालीं छाती वर करून निजलेल्या मनुष्याप्रमाणें या सरोवराचा आकार आहे! सबंध सरोवरास प्रदक्षिणा करण्यास तीन मैल चालावें लागतें; इतकीं या सरोवराच्या हातापायाची बोटें चारी दिशेला आंत आंत गेलेली आहेत. शिवाय सरोवराचे कांठावर लहान मोठीं खासगी व संस्थेच्या मालकीचीं होडीघरें अनेक असल्यामुळे हें सरोवर एकदम कोठूनही दृग्गोचर होत नाहीं. सरोवराच्या एकाभागी यावें तो दुसरा भाग अदृश्य होतो. याप्रमाणें सरोवर प्रवाशाशीं जणूं कांहीं लपंडाव खेळत असून आपलें एकंदर स्वरूप त्याला एकदम कधींच दिसूं देत नाहीं. नैनिताल किंवा कँडी येथील सरोवरांची स्थिति यापेक्षां निराळी आहे. तीं सरोवरें एकदम व सबंध दृग्गोचर होतात. म्हणून तीं सरोवरें या कोडैकनाल सरोवराचे पेक्षां जास्त सुंदर दिसतात असे मला वाटलें. शिवाय या सरोवराच्या आंत आंत गेलेल्या हातपायवजा टोकांना लव्हाळें, गवत व चिखल असल्यामुळे हा सरोवराचा भाग कमी नयनमनोहर दिसतो. तरी पण हे सरोवर हा एक कोडैकनालचा प्रमुख अलंकार आहे यांत शंका नाहीं. याचे एका बाजूस दगडी धक्का बांधलेला असून सरोवराचे फाजील पाणी पाटानें खालीं नाल्यांत सोडलें आहे. या सरोवरासभोवती डोंगराचे कडे पडलें आहे असें वर सांगितलें आहे. त्या डोंगराच्या कड्यावरील चढावाचे रस्त्यानें आम्ही वर गेलों.
{{gap}}तेथून '''बेअर शोला फॉल्सची''' (अस्वलारण्य धबधबा हें इंग्रजी नांवाचें अक्षरशः भाषांतर आहे) पाटी पाहिली. म्हणून आम्ही तो धबधबा पाहण्यास गेलों. याचा रस्ता खोल खोल दोन डोगरांच्या चिळणीवजा दरींत जातो. रस्ता कसचा तो! ती एक अक्षरशः पाऊल वाट होती; त्या वाटेवर गळून पडलेल्या पानांचा खच पडला होता;<noinclude></noinclude>
8q9wtnjoh9du7u7rg0dmh0ch20ch26t
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/५९
104
110828
232658
2026-06-25T11:04:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232658
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोडैकनाल|४१ }}</noinclude>वाटेवरील वृक्ष मात्र उंचच उंच होते व त्यांची गर्द छाया सर्व वाटभर पडली होती. पुढें दाट झाडी संपली व गवताळ व छोट्या झुडूपांची पायवाट लागली. शेवटी आम्ही एका खडकाळ व दगडाळ ओढ्याशीं आलों. हाच ओढा चाळीस पन्नास फूट उंचीच्या खडकावरून पडत होता. आतां ओढ्याला पाणी फारच थोडें होतें; पण पावसाळ्यांत हा मोठा प्रेक्षणीय धबधबा असला पाहिजे असें आम्हांला वाटलें. धबधब्याच्या ठिकाणासारखी ठिकाणें सह्याद्रीच्या खोऱ्यांत पुष्कळ पहावयास सांपडतात. त्यामुळे या धबधब्याचें आम्हांला फारसें नवल वाटलें नाहीं. नंतर आम्हीं परत सरोवर रस्त्याशीं आलों. चवकशी करतां रस्त्यापासून कोडैकनालची वेधशाळा तीन मैल आहे असें कळलें. तेव्हां आम्हीं तें ठिकाण आजच पाहून घेण्याचें ठरविलें व तडक वेधशाळेच्या रस्त्यानें चाललों. कोडैकनालचा हाच मुख्य लांबचा सहल करावयाचा रस्ता होय. हा रस्ता सरोवरा सभोवारचा सर्वांत उंचावरचा रस्ता होय. एका बाजूस डोंगर दहा बारा फूट तोडून तो रस्ता केलेला आहे. त्याला वळणें पुष्कळ आहेत. तो डोंगर शिखराकडे सारखा चढत गेलेला रस्ता आहे. हा लहानसा घाटच आहे म्हणाना! सर्व घाट प्रेक्षणीय आहे. रस्त्याचे दोन्ही बाजूंस प्रचंड वृक्ष आहेत. त्यांमध्ये मुख्यतः युकॅलिप्टस वृक्षांची झाडी फार आहे. या वृक्षांची उंची व वाढ विलक्षण आहे. येथें हे वृक्ष सवाशें फूट उंच गेलेले असावे असें वाटलें. दोन्ही हातांच्या वावेतसुद्धां ज्यांचें खोड मावणार नाही येवढाले प्रचंड कांहीं कांहीं वृक्ष पाहिले. सिलव्हर ओक वृक्षही वाटोवाट पुष्कळ लागले. तसेंच कांहीं ठिकाणी कॅझेरिना वृक्षही लागले. नांवें ठाऊक नसलेले नाना वृक्ष शिवाय होतेच. या शीतल निवासस्थानाचे वृक्ष इंग्लंड वगैरे थंड देशांत होणारे आहेत. नाना रंगांच्या फुलांच्या मोठमोठ्या वेली वृक्षावर चढलेल्या दिसत होत्या. त्यांत एका वेलीचीं पांढरी शुभ्र मोठीं टपोरी फुलें असून त्याचा आकार थेट ग्रामोफोनच्या शिंगाच्या आकाराचा पाहून मला फारच नवल<noinclude></noinclude>
r3cdyvcod13hz8ujy5jykjt2t1dn5ug
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६०
104
110829
232659
2026-06-25T11:06:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232659
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>वाटले; तसेच एका साधारण खुज्या वृक्षावर तांबडी फुलं पाहिली. प्रथमतः हीं मला बेअरशोला घवघव्याचे ठिकाणी दिसली. हे छोटे वृक्षही या पर्वतराजीवर जिकडे तिकडे दिसले. यांना काळसर, तांबडी अशी मोठी फुले येतात; तें फूल म्हणजे खरोखरीच सृष्टिदेवीनें मनुष्यास अर्पण केलेला पुष्पगुच्छ आहे असें वाटलें. मी हे मोठे फूल तोडून पाहिलें तो माझें आश्चर्य दुणावलें. या फुलाच्या गुच्छामध्ये एकंदर लहान लहान पण सारख्या आकाराचीं तेरा फुलें होतीं. त्याचे मधोमध एक फूल होते व सभोवार सहा सहा फुलांच्या दोन रांगा होत्या. यामुळे मधल्या फुलापासून मोजलें कीं, साहा बाजूंस तीन तीन फुलांची रांग दिसे. या गुच्छाचे सभोंवार हिरवी पानें होतीं व सबंध फुलें व पानें एका देठावर वाढलेलीं होतीं! किती मनोहर ही फुलांची रचना! सृष्टिदेवीनें आपल्या सुंदर हातांनी गुंफलेला हा गुच्छ नव्हे काय? असे शेंकडों निसर्गकृत पुष्पगुच्छ या शीतल निवासस्थळीं आम्हांला तीन्ही दिवस सारखे दृष्टीस पडत होते. या वृक्षाचें नांव अशोक आहे व रावणाने सीतेला असल्या अशोक वनांत ठेविली होती है मला लंकेला परत गेल्यावर कळलें.
{{gap}}याप्रमाणे सर्व रस्ताभर वृक्षवेलींची दाट सावली तर होतीच पण त्यांनीं रस्त्याला जणूं कांहीं शृंगारलें होतें. शिवाय डोंगराच्या कापलेल्या भागावर सारखी उगवलेल्या नानाविध फर्न व शेवाळ जातीचीं छोटीं झुडपे जणूं कांहीं सृष्टिदेवीने रस्त्याच्या कडेला मुद्दाम लावलीं आहेत असा भास होत होता. अशा तऱ्हेच्या सुंदर व मनोहर रस्त्याने आम्ही किती उंच उंच चाललों याचे भान राहिलें नाहीं. पण शेवटीं एकदांचे आम्ही वेधशाळेशीं येऊन पोहोंचलों. आम्हांला येथें येण्यास तबल दोन तास लागले. आजचा डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस असून तो आदितवार होता व ती तिथि पौर्णिमेची होती. वेधशाळेवर "Sun Physics Observatory" अशी पाटी होती. वेधशाळेच्या इमारतीसभोंवतीं छोटीशी फुलबाग होती व एक लाकडी<noinclude></noinclude>
182m7qe5muoai994nf600lcvhdux13w
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६१
104
110830
232660
2026-06-25T11:11:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232660
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोडैकनाल|४३ }}</noinclude>छोटा मनोरा होता. त्याला लाकडीच जिना होता. त्याचे दार उघडें असल्यामुळे आम्ही जिना चढून अगदी वरच्या गच्चीवर गेलों. तेथें वायुवेगदर्शक व वायु-दिशादर्शक यंत्र ठेविलेली होती. हे कोडैकनाल पर्वतराजीवरील सर्वात उंच ठिकाण होय. उंची मोजणाऱ्या यंत्रावरून हें सात हजार फूट उंच आहे असें आम्हांस कळले; पण समुद्रसपाटीपासून मदुरा जिल्हा सामान्यतः चारपांचशे फुट उंच असल्यामुळें व मदुरेस माझें यंत्र मी शून्यावर आणून ठेवले असल्यामुळे हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ७५०० फुटांच्या उंचीवर आहे हें उघड झालें. कोडैकनाल शीतलनिवासस्थान पालनी पर्वतराजीवरील कमी अधिक उंच टेकड्यांवर व त्यांचे उतारावर कसें बसलेलें आहे हे येथून स्पष्टपणे कळले. आम्हीं वेधशाळेच्या मनोऱ्यावर गेलों तोंच सूर्य अस्तास गेला व त्याच्या मावळत्या किरणांनीं आकाशांतील ढग जणूं कांहीं रक्तबंबाळ करून सोडले. आजचा दिवस एकंदरीत धुक्याचा नव्हता. हें आमचें मोठें भाग्य होतें. कारण येथें नेहेमी फार धुके असतें व मग सभोवारचा देखावा मुळींच दिसत नाहीं. याचा अनुभव आम्हांला दुसऱ्या दिवशीं सकाळीं आला.
{{gap}}आतां संध्याकाळ झाली खरी; पण आजचा पौर्णिमेचा दिवस असल्यामुळे आम्हीं वेधशाळेहून बरेच खाली आल्याबरोबर चकचकीत चंद्रप्रकाश पडला व त्या चंद्रप्रकाशांतून चालण्याची मोठी मजा वाटली. आतां साधारणतः उताराचा रस्ता होता. म्हणून फारसे श्रम वाटत नव्हते. तरी आतां आम्हीं चांगले चार तासांच्यावर सारखे चालत असल्यामुळे पायांनीं सत्याग्रह करण्याचें मनांत आणले. म्हणून आम्हीं सावकाश व जड पावलांनीं चालूं लागलों. आतां जरी उत्तम चांदणें पडलें होतें तरी वाटेनें खुब दाट झाडी असल्यामुळे व मधून मधून डोंगरांची मोठी भिंत रस्त्याला लागून राहिल्यामुळे रस्ता अगदीं काळोखाचा होई. हा प्रवास एकट्याने करण्याची पाळी आली असती<noinclude></noinclude>
8kiw97c86n2vbfwpqbwzuoj26r1db0j
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६२
104
110831
232661
2026-06-25T11:15:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232661
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>तर यावेळी मला फार भय वाटलें असतें यांत शंका नाहीं. पण वर निर्दिष्ट केलेल्या सुभाषिताप्रमाणे मला समानशील एंजिनियराचा समागम घडला असल्यामुळे व आम्ही दोघेजण बोलत बोलत चालत असल्यामुळे या निर्जन वाटेने जातांना आम्हांला भय वाटलें नाहीं; तर उलट आनंदच वाटला. दोन रस्ते लागले म्हणजे कोणत्या रस्त्याने जावयाचें याची मोठी पंचाईत येऊन पडे व एखादा मनुष्य भेटेपर्यंत आम्हांला रस्त्यांत वाट पहात उभे रहावें लागे. अशा अरण्यमय ठिकाणी चुकल्यास मोठी फजितीची नव्हे जीवावर बेतण्याची वेळ यावयाची. पण आम्हांला बहुतेक ठिकाणीं मनुष्यें भेटलीं. अगदी शेवटच्या दोन- तीन रस्त्यांच्या तिठ्यावर एक युरोपीयन जोडपें भेटलें. त्यांनी आम्हांला बाजारच्या रस्ता बरोबर सांगितला. मग आम्ही बाजारांत येऊन पोहोंचलों. घड्याळांत पहातों तों रात्रीचे आठ होऊन गेले होते. म्हणजे आमची दोन प्रहरपासून सुमारें पांच तासांची पायपिटी झाली. बाजारांत एका उपाहारगृहांत भोजन आटोपून आम्हीं आपल्या विश्रांतिगृहास आलों.
{{gap}}सकाळी साडेसहा वाजतां मी उठलों तों बाहेर कोण थंडीचा कडाका व धुक्यानें तर सर्व भूमिभाग व्यापलेला होता. जवळचें सुद्धां कांहीं एक दिसेना. प्रातर्विधि आटोपेपर्यंत धुके किंचित् कमी झाले व माझे नवे मित्र एंजिनियरसाहेबही उठले. आम्हीं कोडैकनाल येथें एकतीस डिसेंबर सन १९३३ व पहिली जानेवारी सन १९३४ अशा संधिकाळच्या एका रात्रीं राहिल्यामुळे आम्हीं कोडैकनाल येथें सन १९३३ व सन १९३४ या दोन्हीं सालीं होतों असें झालें व एका विशिष्ट रात्रीच्या निवासानें आम्हांला दोन वर्षे कोडैकनालमध्यें राहण्यास सांपडलें असें शपथेवरसुद्धां सांगतां येईल अशा प्रकारचें कांहींसें खरें व कांहींसें थट्टेचें भाषण करीत आम्हीं पोस्ट ऑफिसपासून जवळच असलेल्या कोकर्सवॉक नांवाच्या प्रेक्षणीय स्थळीं गेलों. कोडैनालमधलें हे सर्वांत नजीकचे प्रेक्षणीय स्थळ होय. ही सहलवाट (कारण ही खरोखरी<noinclude></noinclude>
9udr6hzlrntuv6vftiv1xw16tbws0c7
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६३
104
110832
232662
2026-06-25T11:17:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232662
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोडैकनाल|४५ }}</noinclude>पाऊलवाट आहे, गाडीरस्ता नव्हे) कोडैकनालच्या पूर्वेकडच्या सर्वांत उंच शिखराच्या कडेनें जाते. जरा पुढे गेलें म्हणजे भयंकर खोल व किर्र रानाची दरी लागते. इतर ठिकाणी दिसणाऱ्या टेकड्या व डोंगराळ भाग येथून दिसेनासा होतो व पाहणाराला एकदम पालनी पर्वताच्या पायथ्याशी असलेला सपाट, सुजल व सुपीक प्रदेश दृष्टीस पडतो. महाबळेश्वरच्या लॉडविक पॉईंटवरून जसा कोकणचा देखावा दिसतो त्यासारखा कांहींसा हा देखावा आहे. पण कोंकण पुष्कळ डोंगराळ व उंच-सखल प्रदेश आहे; तर येथून दिसणारा मदुरा जिल्हा अगदीं सपाट आहे. या डोंगराच्या उताराला झाडी मुळींच नाहीं. येथें झाडी होणें शक्य नाहीं. या डोंगराच्या शिखरावर फार जोराचा वारा नेहमी असतो, म्हणून मोठे वृक्ष होत नाहींत. मात्र नानारंगी फुलांचीं नाना तऱ्हेची गवतें व बारिक झुडुपें यांनी हा सर्व डोंगर शोभायमान झालेला आहे. कितीतरी तऱ्हेचीं येथें फुलेंच फुले दिसतात. सृष्टिसुंदरीनें या डोंगरावर जणूं कांहीं फुलबाग तयार केली आहे असा आम्हांस भास झाला. या पर्वताच्या अगदीं माथ्यावर एक प्रार्थना- मंदिर आहे. तेथें आम्ही गेलों; व कांहीं वेळ तेथून सभोवारचा सुंदर देखावा पाहिला; पण लवकरच धुक्यानें आकाश भरत चाललें व सृष्टिदेवीनें आपल्या देखाव्यावर पांढरा पडदा सोडला तेव्हां नाटकाचा शेवटचा पडदा पडला म्हणजे प्रेक्षक भरकन् नाटकगृह सोडतो त्याप्रमाणें आम्हीं तें ठिकाण सोडलें व बाजारांत परत आलों. तेथें सकाळची न्याहारी उरकली व सुमारें ९॥ वाजतां कोडैकनालचें अद्वितीय पण फार दूरवर असलेलें प्रेक्षणीय स्थळ पिलररॉक्स (खडकाचे अजस्र खांब) पाहण्यास निघालों. हे खडक पोस्टऑफिसपासून साडेचार पांच मैल अंतरावर आहेत. पहिला दोन मैलांचा रस्ता आम्हीं आदल्या दिवशीं सायंकाळी व रात्रीं चांदण्यांत पाहिलेला, व पादाक्रांत केलेला होय असें आमच्या ध्यानांत आलें. तेथून वेधशाळेचा रस्ता उजव्या बाजूस वळतो व खडकाच्या खांबाला जाणारा रस्ता<noinclude></noinclude>
8slkrj1ew0zosqlvjle021wr0nm3f4f
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६४
104
110833
232663
2026-06-25T11:21:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232663
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>डाव्या हातास वळतो. हा रस्ता आधींच्या रस्त्याप्रमाणें मोठा सुंदर रस्ता आहे. पुढे पुढे तर दोन्ही बाजूंस दाट व गर्द अरण्य लागतें. पण हा रस्ता पुष्कळच उंचसखल आहे. एके ठिकाणीं तर आम्हांला डाव्या हाताला खोल खोरेंच लागले व ज्याप्रमाणें '''महाबळेश्वराकडून''' पांचगणीकडे येतांना भाजीपाल्याचे मळेच मळे वेण्या खोऱ्यांत लागतात तसे भाज्यांचे मळे या खोऱ्यांत केलेले दिसले. पुढें पांबर नांवाच्या छोट्या नदीवरील काँक्रीटचा नवा पांढऱ्या रंगाचा सुंदर पूल लागला. येथेही छोटासा धबधबा होता. येथल्या धबधब्याची शोभा पहात थोडीं मिनिटें आम्ही पुलाच्या कठड्यावर विश्रांति घेतली व मग पुन्हां चालू लागलो. तांबड्या अशोकाची झाडे या वाटेलाही पुष्कळ लागली. दोन तास चालून झाले तरी खडकाच्या खांबाचा पत्ता नाहीं, तेव्हां अजून किती चालावयाचें कोण जाणे अशा काळजीत आम्ही पडलों. वाट चुकून पुढें आलों कीं काय, अशी शंका मनांत आली तोच थोडा सपाट भूमिभाग लागला; तेथें गोल्फलिंक्सही दिसल्या व गोल्फकबाची इमारतही नजीक दृष्टीस पडली व त्या गोल्फक्लबाच्या इमारतीच्या समोरच्या रस्त्याच्या डाव्या बाजूस 'खडकाचे खांबाकडे' अशी पाटीही पाहिली. तेव्हां आम्ही चुकलों नाहीं व आतां येथून ते खडक खांब फार दूरवर नसावे अशी खातरी पटली. गोल्फलिंक्सचें मैदान टाकलें तोंच रस्त्याचे दोन्ही अंगांस दाट व हारीने लावलेल्या फर वृक्षांचें रान लागलें. तें रान संपतें तोंच त्या पर्वताची कड आली व कोकर्स वॉकहून दिसणाऱ्या दरीप्रमाणे खोल दरी व पर्वताच्या पायथ्याचा सपाट भूमिभाग दृग्गोचर झाला. आमच्या सुदैवानें त्याचवेळीं धुकें नाहींसें झालें व ते अद्वितीय खडक खांब आमच्या दृष्टीस पडून आम्हीं आश्चर्याने थक्क होऊन तोंडांत बोटेंच घातली. ही दरी कॉकर्सच्या दरीप्रमाणे एकदम खोल झालेली नाहीं. या दरीच्या एका बाजूस टेकड्यांची उतरती रांगच रांग लागते; एक टेकडी व दुसरी टेकडी यांमध्यें निमुळता असा खोलगट भाग आहे. ज्याप्रमाणे बायकांच्या झग्याला चुण्या पाडलेल्या असतात तशी यां हिरव्यागार टेकड्यांची ठेवण आहे. जणूं कांहीं सृष्टिदेवीने पाचूच्या रंगाचा झगा पेहेरला आहे. या चुण्याचुण्याच्या हिरव्या टेकड्यांच्या प्रारंभी हे खडक खांब आहेत. हे तीन खडक एकाला एक चिकटलेले असून ते चारशे फूट उंचीच्या खांबासारखे उभेच्या उभेच आहेत.<noinclude></noinclude>
98y6fqfku1h8z28kmqp2v24c9suiez5
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६७
104
110834
232664
2026-06-25T11:25:44Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232664
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोडैकनाल|४७ }}</noinclude>त्यांचे माथ्यावर भुरटें रान आहे. या खडकांचा आकार विलक्षण खरा; दोन खांबांच्यामध्ये खोल व अरुंद अशी भेग आहे. ती फार भीषण वाटते. आम्ही या खडकांची ती भव्य व भीषण शोभा पहात किती वेळ तरी त्या ठिकाणी बसलो. पंधरावीस मिनिटें झालीं नाहींत तोंच पुन्हा धुकें वाढू लागलें व त्याने सर्व आकाश व्यापून टाकिलें व खडक खांब अदृश्य झाले. आमचे मागून मोटारींतून पुष्कळ युरोपियन स्त्री-पुरुष येथल्या झाडीत वनभोजनाकरितां आले; पण येथे खडक-खांबही अदृश्य व सर्व भाग धुक्यानें भरलेला, तेव्हां येथें वनभोजन करण्यांत मौज नाहीं असें पाहून ती मंडळी त्या रस्त्यानें वेधशाळेच्या पलीकडील '''पावरें''' गांवच्या रस्त्याकडे वनभोजनास गेली. हें आम्हांला या मंडळींनीं वनभोजनाच्या झाडीच्या शेजारच्या पाटीच्या खांबाला अडकवून ठेवलेल्या चिटीवरून कळले. धुके वाढत चाललें, तेव्हां येथें अधिक बसण्यांत अर्थ नाहीं, सुदैवाने आम्हांला ते खडक-खांब पंधरावीस मिनिटे तरी पाहण्यास मिळाले, यांतच समाधान मानून आम्ही परत फिरलों. आतां बारा वाजून गेले होते व आम्ही तीन तास सारखे चालत होतों. पण परत येतांना आम्हीं दोन तासांनींच बाजारपेठेला आलों. कारण परत येतांना रस्ता उताराचा होता. पांच तासांच्या पायपिटीने आम्हांला खूप भूक लागली होती. तेव्हां आम्हीं फराळाचा चांगलाच समाचार घेतला हे सांगावयास नको.
{{gap}}यानंतर आम्हीं विश्रांतिगृहांत विश्रांति घेतली व संध्याकाळी थोडेसे सरोवराकडे फिरत जाऊन रात्रींचे जेवण करून परत आमच्या विश्रांतिस्थानीं आलों. याप्रमाणें आम्हीं नव्या वर्षाचा पहिला दिवस मोठ्या मजेत सृष्टिसौंदर्याच्या आगरी सृष्टिसुंदरीचीं नाना रूपें पाहण्यांत घालविला. म्हणून हा दिवस आमच्या पुष्कळ दिवस स्मरणांतून जाणार नाहीं असे मी व माझ्या नव्या मित्रानें एकदम उद्गार काढले.
{{gap}}तारीख २ जानेवारी १९३४ रोजी सामानाची बांधाबांध करून सकाळी आठ वाजतां आम्हीं बाजारांत आलों व कोकर्सवॉकच्या सुंदर देखाव्याचें पुनर्दर्शन पण शेवटचें दर्शन घेऊन मग न्याहारी केली. नंतर एम्पोरियम नांवाच्या फोटोग्राफरच्या दुकानीं गेलो. हे केवळ फोटोग्राफचेंच दुकान नव्हतें. एम्पोरियम नांवाप्रमाणें हें सर्व प्रकारच्या जिनसांचें दुकान होतें; येथें मी कोडैकनालचे मार्गदर्शक पुस्तक विकत<noinclude></noinclude>
nluqojesh40nnoh236gg98s5bawgapp
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६८
104
110835
232665
2026-06-25T11:29:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232665
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>घेतलें. माझ्या मित्रानें कांहीं फोटो घेतले व मी आप्तेष्टांस व मित्र मंडळीस पाठविण्याकरितां बरींचशीं चित्रांचीं कार्डे घेतली. शिवाय माझ्या प्रवासी चित्रसंग्रहांत ठेवण्याकरितां दोन चित्रांचीं पुस्तकेंही घेतलीं. नंतर सरोवरासभोंवार पुन्हा एकदां हिंडलों. सरोवराच्या बोटक्लबाच्या एका होडीघराकडून दुसऱ्या होडीघराकडे क्लबाचा शिपायी होडी घेऊन चालला होता. तेव्हां आम्हीही त्या होडींत बसलों व अशा अचानक तऱ्हेनें आम्हांला सबंध सरोवर नव्हे पण सरावरोच्या हाताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत होडीनें जातां आलें म्हणून आम्हांला आनंद झाला. आम्हीं शिपायाच्या हातावर चिरीमिरी ठेवून व त्याचे आभार मानून पुन्हा बाजारपेठेत आला. आतां बाराचा सुमार झाला होता. आम्हांला कोडैकनालला येऊन दोन दिवस पुरे झाले होते. आतां आणखी तीन तासांकरितां सबंध दिवसाचें विश्रांतिगृहाचे भाडे देण्यांत अर्थ नाहीं म्हणून आम्हीं आपलें सामान हमालणीचे डोक्यावर देऊन मोटार बसवाल्याच्या ऑफिसांत सामान आणून ठेवलें. मोटारची तिकिटे काढलीं व मग दोन प्रहरचा फराळ केला. फराळ होईतों कोडैकनाल स्टेशनहून मोटार आली. तीच मोटार तीन वाजतां परत जावयाची असल्यामुळे आम्हीं एक दोन तास मोटारींत बसून कोडैकनालचे मार्गदर्शक पुस्तक वाचण्यांत घालविले. कोडैकनाल येथे दोन दिवस कां होईना पण आम्हीं मोठ्या मजेनें सृष्टिदेवीच्या सान्निध्यांत घालविले याबद्दल व अचानक पडलेल्या गाठीबद्दल आम्हां दोघांना मोठें नवल व कौतुक वाटत होतें. माझ्या मित्रानें मेटूर बंधारा पहाण्यास येण्याविषयीं मला फार आग्रह केला. पण माझ्या ठरलेल्या प्रवासक्रमामध्यें त्याचा आंतर्भाव होत नव्हता. पुढेमागें केव्हां तरी मी तें धरण व त्या बाजूची दुसरी प्रेक्षणीय स्थळे पहाण्यास येईन असें त्या मित्रास आश्वासन दिलें. आपले मनांत पुढल्या वर्षी साधल्यास काश्मीरास जावयाचें आहे; तेव्हां जातांना आपण पुण्यास अवश्य येऊं असें त्यानें मला सांगितले. याप्रमाणे नूतन मित्राजवळ गप्पागोष्टी करीत आम्ही मागें वर्णन केलेल्या रस्त्यानें परत कोडैकनाल स्टेशनला आलों. तेथें रिफ्रेशमेंटरूममध्ये आम्हीं सहफराळ केला व मग आगगाडीत बसलों. मी रात्रीं आठ साडेआठवाजतां डिंडिगल स्टेशनवर उतरलों व माझे मित्र पुढे गेले.

{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
kpvifvacn5cnwqak1tuvu1bdxmx5koj
पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/६९
104
110836
232667
2026-06-25T11:35:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
232667
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण ५ वें.'''}}}}
{{rule|7em}}
{{center|'''डिंडिंगल आणि पालघाट'''}}
{{gap}}{{x-larger|'''ज्या'''}}प्रमाणे सह्याद्रि पर्वताची दक्षिणोत्तर पसरलेली लांबचलांब रांग व आरबी समुद्र यांमधली सखल अरुंद जमिनीची पट्टी हिला कोंकण प्रांत म्हणतात, त्याप्रमाणे नीलगिरी पर्वताच्या दक्षिणेस पालनी, आनामलाई, कार्डमम् व त्रावणकोर इत्यादि नाना नांवांनी ओळखली जाणारी व थेट कन्याकुमारीपर्यंत पोहोंचलेली पर्वताची रांग व आरबी समुद्र यांमधल्या सुपीक, सुजल व सपाट प्रदेशास केरल हें नांव आहे. हल्ली हा प्रांत त्रावणकोर व कोचीन या दोन संस्थानांनी व्यापलेला असून केरळाचा उत्तरेकडचा थोडा भाग मात्र मद्रास इलाख्यांत मोडतो.
{{gap}}नाशीकपासून नीलगिरीपर्यंत पसरलेला प्रचंड सह्याद्रि पर्वत व त्याचे दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत पसरलेला अर्वाचीन पश्चिम घाट या नांवानें ओळखला जाणारा जंगलमय पर्वत यांमध्यें वीस पंचवीस मैलांचं समुद्रसपाट खिंडार आहे. हे खिंडार केरल प्रांताचे पूर्वद्वार होय. या पूर्वद्वाराच्या दोन्ही बाजूंस '''दोडा बेटा व अनामलाई''' नांवाचे आठ आठ हजार फूट उंचीचे दोन डोंगररूप द्वारपाल सृष्टिदेवीनें ठेवून दिले आहेत. याच सखल सुजल सुपीक भागांतून मीं काशी रामेश्वराची यात्रा करतांना प्रवास केला. वाटेनें मीं प्रसिद्ध डिंडिंगल किल्ला पाहिला. त्याचें व पालघाट खिंडाराचें वर्णन या प्रकरणांत देण्याचा विचार आहे.
{{gap}}त्यांपैकी पहिले ठिकाण '''डिंडिंगल''' व तेथला इतिहासप्रसिद्ध कातळावरील किल्ला होय. या किल्ल्याचा व गांवाचा उल्लेख मराठ्यांच्या म्हैसूराकडील स्वाऱ्यांच्या व हैदर व टिपु सुलतान यांच्या कारकीर्दीच्या हकीकतीत पुष्कळ वेळां येतो. यामुळे या नांवाचा श्रुति-<noinclude>
{{gap}}४</noinclude>
oukg57mwpp7qs4snfh9lnni6o0tu0et