विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.11 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१२ 104 81340 233182 232757 2026-07-15T12:08:35Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233182 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|७}} {{rule}}</noinclude>सपरिवार याठिकाणी येऊन दोन दिवस राहिलों होतों. यामुळे या मैलाशीं आल्यावर त्या आमच्या मे महिन्यांतील आनंददायी प्रवासाची मला आठवण झाली. असो.<br> {{gap}}येथून आमचें रात्रीच्या मुक्कामाचे ठिकाण शिरवळ हें बरोबर दहा मैल होतें. तेव्हां आठांच्या आंत आह्मीं आपलें ठिकाण गांठूं असा आह्माला भरंवसा वाटू लागला, व आहीं आमच्या लोहाश्वावर आरूढ होऊन लीलेनें चालूं लागलों. चोवीस मैलाशीं कामथडी ह्मणून वाटेवरच गांव लागतें. तेथून डाव्या हाताला पुरंदर किल्ल्याची वाट फुटते. पुरंदर किल्ला येथून अकरा मैल आहे व येथूनच जरा पुढे गेल्यावर उजव्या हाताला भाटघरचें प्रचंड धरण याची व भोरची वाट लागते. कामथडीहून भाटघर सहा मैल आहे व तेथून पुढे भोर चार मैल आहे. आह्मीं आमच्या मे महिन्याच्या बैलगाडीच्या प्रवासांत भाटघर व पुरंदर अशीं दोन्ही स्थळें पाहिलीं होतीं यामुळे हे सर्व रस्ते व हीं सर्व ठिकाण मूर्तिमंत माझ्या डोळ्यासमोर उभीं राहिली. व एकाच प्रवासांत दोन प्रवासांचा अनुभव मला आल्यासारखें वाटलें; आतां साधारण रात्रच झाली होती; पण चांदणं थोडेसें होतें. तरी पण आतां सभोवारचा देखावा दिसेनासा झाला व यामुळे हा प्रवास थोडासा कंटाळवाणा व भयप्रदही वाटूं लागला. इतक्यांत आह्मी थोडे खोलखोल जाऊं लागलों, असें आह्मांस वाटलें व पहातों तो एका लोखंडी कठड्याच्या अरुंद अशा पुलावर आह्मी आलों व हा नीरानदीचाच पूल काय अशी आह्मांस शंका आली. पण पुलावर नांव दिसेना. कदाचित् नांव पुलाच्या प्रारंभींच्या दगडी- कामावर असेल असें समजून आह्मीं थोडेसे परतलों. पण पुलावर कोठेहि नांव दिसेना. घड्याळांत पहातां आठ वाजले. तेव्हां हाच नीरेचा पूल असला पाहिजे असा आम्ही मनाचा निश्चय केला. येथून शिरवळ दोनच मैल होतें. तेव्हां मुक्कामाला आलींच, असें आह्मांस वाटले. शिरवळ गांवाच्या बाहेर रावबहादूर देशपांडे ह्मणून रेव्हेन्यू खात्यांत मोठ्या हुद्यावर असलेले पेनशनर गृहस्थ राहत असत. त्यांची माझी एकदां भेट झाली होती, त्याचा फायदा घेऊन त्यांच्या बंगल्यांत रात्रीची विश्रांति घेण्याचा<noinclude></noinclude> lwx9zstyq3cj920n2rkcphdgfd9tf5w पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/११ 104 81364 233181 232756 2026-07-15T12:05:02Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233181 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>कांहींच दिसत नाहीं. यामुळे जातांना जरा भीतीच वाटते. पण लवकरच दुसऱ्या टोकांतून उजेड दिसूं लागतो व मग भीति कमी होते. तरी पण बोगद्यांतून एकंदरींत पायगाडीनें जाण्याची मजा वाटते यांत शंका नाहीं. बोगद्याच्या टोकाला एक टुमदार डाकबंगला आहे. आमच्या पायगाड्या उताराला लागल्यावर अर्थात् वाऱ्यासारख्या वेगाने जाऊं लागल्या. येथून तीस मैलांवर असलेल्या नीरानदीच्या पुलापर्यंत रस्ता सपाट किंवा उतरताच आहे, असें म्हटलें तरी चालेल. आपण एका दरींतून चाललों आहोत असा भास होतो. कारण आपल्या दोन्ही बाजूंस लहानमोठ्या टेकड्यांची रांगचीराग लागते व रस्ता व टेकड्या यांच्या दरम्यानच्या सपाट भागांत हिरवीगार शेतें लागतात. चवदा व पंधरा मैलांच्या सुमारास शिवापूर हे गांव लागतें. हे गांव आंब्यांकरितां फार प्रसिद्ध आहे. पुण्यास शिवापुरचा आंबा फार येतो व आंबाही चांगल्या जातीचा असतो. येथे मैलदीडमैल सारखी आंबराईच लागते. पण ही जुनी आंबराई आतां कमी होत चालली आहे. नवी लागवड विशेष होत नाहीं, यामुळें थोड्या वर्षांनी ही आंबराई पार नाहींशी होण्याची भीति आहे. शिवापुरच्या बाजूनें एक चांगला ओढा वाहात जातो. येथें आह्मांला बराच गारवा वाटू लागला. आमच्या पायगाडीचा प्रवास मात्र आतां झपाट्यानें चालला होता व हां हां म्हणतां म्हणतां मैलावर मैल येत होते. बरोबर सात वाजता आम्ही बावीसाव्या मैलाशीं आलों. येथून उजव्या हातास पंतसचिवांचें नसरापूर ह्मणून एक तालुक्याचें गांव आहे, त्याची वाट फुटते. नसरापुराहून दोनतीन फर्लांगांच्या अंतरावर बनेश्वर ह्मणून एका नदीच्या काठीं महादेवाचें देऊळ आहे. या देवळासमारेच्या बऱ्याच भागांत झाडी फारच दाट आहे. ह्मणूनच या ठिकाणास बनेश्वर ह्मणतात. देऊळ चांगले काळ्या दगडांनी बांधलेलें आहे व देवळासमोर दोन सुंदर कुंडे आहेत. या कुंडांत काळसर निळसर रंगाचे खूप मासे आहेत. पुण्याहून बनेश्वर चोवीस मैल आहे व पायगाडीने एका स्वतंत्र दिवसाची ही सफर आहे. मी हें ठिकाण लहानपणीं पुण्यास शिकण्यास असतांना तर पाहिलेच होतें. पण गेल्याच मे महिन्यांत मी बैलगाडीने सकुटुंब-<noinclude></noinclude> mgb5fo5y930fsf2y4gd3cay5uluhnhj पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१३ 104 81366 233184 232758 2026-07-15T12:14:19Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233184 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>मी बेत केला होता. माझ्या पायगाडीच्या प्रवासाचा एकाएकीं बेत झाल्यामुळें त्या गृहस्थांना आधी पत्र पाठविणें शक्य नव्हतें. पुण्याहून निघतांना तार करावी असें एकदां मनांत आलें होतें, पण त्या ठिकाणास तार असेल किंवा नाहीं या शंकेनें व इतकें करण्यास स्वस्थपणाही नसल्यामुळें तें तसेंच राहून गेलें होतें. अर्थात् त्या गृहस्थाकडे अनपेक्षितपणानें जाणें आह्मांस भाग होतें. शिरवळ गांवाच्या जवळ आल्यावर आम्हीं रावबहादूरांच्या बंगल्याची चौकशी करूं लागलों, तों त्यांचा बंगला शिरवळाच्या पलीकडे आहे असें कळलें. अशा वेळीं अशी बातमी म्हणजे दुष्काळांत तेराव्या महिन्याप्रमाणें वाटते. कारण, आतां आमचीं घोडीं थकत आलीं होतीं. रात्रीमुळे फार वेगानेही जातां येईना. विचारपूस करीत करीत आह्मी शिरवळ गांवाला फुटणाऱ्या रस्त्याशीं आलों. तेथें समजलें कीं, देशपांड्यांचा बंगला पुणे-साताऱ्याच्या रस्त्यावरच आणखी दोन मैलांवर डाव्या बाजूसच आहे. माझी कल्पना बंगला गांवाच्या आसपास असेल, अशी होती. पण तो दोन मैलांच्या लांबीवर आहे असें ऐकून आमच्या थकलेल्या जीवाचें धाबे दणाणलें, व शिवाय त्या गृहस्थांच्या घरीं जाण्यास अवेळ होणार असें वाटूं लागून त्यांना उगाच आपल्याकरितां त्रास पडणार अशी भीति वाटूं लागली. आतांची वेळ रात्रीची; रस्ताही चढावाचा लागूं लागला; समोर काळा काभिन्न डोंगर दिसूं लागला व सभोवार भयाण ओसाड माळचमाळ लागूं लागले. जवळपास कोठे झोपडीची किंवा वस्तीची खूण दिसेना. यामुळे आपण वाट तर चुकलों नाहीं किंवा त्यांच्या बंगल्याच्या पुढें तर आलों नाहीं अशी शंका येऊ लागली. इतक्यांत उजव्या हाताला एक जुनें देऊळ दृष्टीस पडलें. आतां बंगला सांपडला नाहीं तर या पडक्या जुन्या देवळांत रात्र काढण्याचा आह्मीं बेत केला व तसेच हळुहळू पुढे चाललों, तों डाव्या बाजूस बंगल्यासारखें कांहींतरी दिसूं लागलें, व आमच्या जीवांत जीव आला. थोड्याच अवकाशाने उजव्या बाजूस सडक फुटलेली दिसली. हीच रावबहादूरांच्या बंगल्याची सडक असली पाहिजे, असा आह्मीं तर्क केला. इतक्यांत बंगलाच स्पष्टपणें दिसला व चक्षुर्वै सत्यं या म्हणीचा<noinclude></noinclude> nfz1c3xeuru6yifrk74qz5acsfcu4am पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१४ 104 81369 233183 232759 2026-07-15T12:12:01Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233183 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९}} {{rule}}</noinclude>आम्हांला प्रत्यय आला. आह्मी बंगल्याच्या दाराशीं येऊन रावबहादूरांची चवकशी केली. रावबहादूर आपल्या खोलींत आंथरुणावर जाऊन पडले होते. त्यांना मी आपले नांवगांव सांगून ओळख पटविली व रावबहादुरांनीं आमचें मनापासून स्वागत केलें. बंगल्याचें ठिकाण बरोबर ठाऊक नसल्यामुळे फार विचारपूस करीत यावें लागलें, यामुळे फार रात्र झाली असें आह्मीं रावबहादुरांस सांगितलें, रावबहादुरांचे घरी आमची जेवण्या- निजण्याची उत्तम सोय झाली हें सांगणें नकोच. परत येतांना दिवसा उजेडी यावें म्हणजे आमची शेतवाडी व बागबागाईत पाहण्यास सांपडेल, असें रावबहादुरांनी सांगितले व मीही त्यांचे म्हणण्याप्रमाणें करण्याचें कबूल केलें. इकडल्या तिकडल्या गप्पागोष्टी झाल्यावर आह्मीं झोपी गेलों व चारपांच तासांच्या पायगाडीच्या श्रमानें दमल्यामुळे आंथरुणावर पडल्या- बरोबर निद्रादेवीने आमच्यावर अनुग्रह केला.<br. {{gap}}पुढे जाण्याकरितां आहीं पहांटेस सहांच्या सुमारास उठलों व चहा- पाणी झाल्यावर बरोबर साडेसहा वाजतां रावबहादूरांचा निरोप घेऊन पायगाडीवर पाय ठेवला. आतां सकाळ झाल्यामुळे सभोवरचा प्रदेश स्पष्टपणे दिसूं लागला. ज्याप्रमाणें पुण्यापासून कातरजच्या घाटापर्यंत साधारण चढताच रस्ता आहे, तसेंच येथेंहि दृष्टीस पडलें. नीरानदी सोडल्यापासून खंडाळ्याच्या घाटापर्यंत साधारण चढताच रस्ता आहे. आह्मी रावबहादुरांच्या बंगल्याहून निघून वाटेला लागलों तोंच पसतिसावा मैल लागला. शिरवळपासून रावबहादुरांचा बंगला तीन मैल दूर आहे. म्हणूनच आदल्या रात्रीं आह्मांला बंगला लागतां लागेना. पण आदल्या दिवशी याप्रमाणें बरेच पुढे आल्यामुळे सातारा बरोबर पसतीस मैलच राहिला. रावबहादुरांचें ठिकाण पुणे व सातारा यांचे मधोमध आहे असे आढळून आलें. आतां पांच मैलानें आह्मांला खंडाळा घाट लागावयाचा होता. हा सर्व भाग अगदीं खडकाळ माळरानी असल्यामुळें दृष्टीला रुक्ष व ओसाड भासे. हिरवीं शेतें कोठें कोठें अगदीं तुरळक दिसत. अर्ध्या तासाने आह्मी ४० व्या मैलाशीं आलों. येथेंच खंडाळें नांवाचें गांव लागतें व येथूनच घाटास सुरुवात होते. आपल्यासमोरच<noinclude></noinclude> ilcxqx3orqa2z5k4kk77bm7zepnqib3 233186 233183 2026-07-15T12:19:06Z कल्पनाशक्ती 3813 233186 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|९}} {{rule}}</noinclude>आम्हांला प्रत्यय आला. आह्मी बंगल्याच्या दाराशीं येऊन रावबहादूरांची चवकशी केली. रावबहादूर आपल्या खोलींत आंथरुणावर जाऊन पडले होते. त्यांना मी आपले नांवगांव सांगून ओळख पटविली व रावबहादुरांनीं आमचें मनापासून स्वागत केलें. बंगल्याचें ठिकाण बरोबर ठाऊक नसल्यामुळे फार विचारपूस करीत यावें लागलें, यामुळे फार रात्र झाली असें आह्मीं रावबहादुरांस सांगितलें, रावबहादुरांचे घरी आमची जेवण्या- निजण्याची उत्तम सोय झाली हें सांगणें नकोच. परत येतांना दिवसा उजेडी यावें म्हणजे आमची शेतवाडी व बागबागाईत पाहण्यास सांपडेल, असें रावबहादुरांनी सांगितले व मीही त्यांचे म्हणण्याप्रमाणें करण्याचें कबूल केलें. इकडल्या तिकडल्या गप्पागोष्टी झाल्यावर आह्मीं झोपी गेलों व चारपांच तासांच्या पायगाडीच्या श्रमानें दमल्यामुळे आंथरुणावर पडल्याबरोबर निद्रादेवीने आमच्यावर अनुग्रह केला.<br>{{gap}}पुढे जाण्याकरितां आहीं पहांटेस सहांच्या सुमारास उठलों व चहा-पाणी झाल्यावर बरोबर साडेसहा वाजतां रावबहादूरांचा निरोप घेऊन पायगाडीवर पाय ठेवला. आतां सकाळ झाल्यामुळे सभोवरचा प्रदेश स्पष्टपणे दिसूं लागला. ज्याप्रमाणें पुण्यापासून कातरजच्या घाटापर्यंत साधारण चढताच रस्ता आहे, तसेंच येथेंहि दृष्टीस पडलें. नीरानदी सोडल्यापासून खंडाळ्याच्या घाटापर्यंत साधारण चढताच रस्ता आहे. आह्मी रावबहादुरांच्या बंगल्याहून निघून वाटेला लागलों तोंच पसतिसावा मैल लागला. शिरवळपासून रावबहादुरांचा बंगला तीन मैल दूर आहे. म्हणूनच आदल्या रात्रीं आह्मांला बंगला लागतां लागेना. पण आदल्या दिवशी याप्रमाणें बरेच पुढे आल्यामुळे सातारा बरोबर पसतीस मैलच राहिला. रावबहादुरांचें ठिकाण पुणे व सातारा यांचे मधोमध आहे असे आढळून आलें. आतां पांच मैलानें आह्मांला खंडाळा घाट लागावयाचा होता. हा सर्व भाग अगदीं खडकाळ माळरानी असल्यामुळें दृष्टीला रुक्ष व ओसाड भासे. हिरवीं शेतें कोठें कोठें अगदीं तुरळक दिसत. अर्ध्या तासाने आह्मी ४० व्या मैलाशीं आलों. येथेंच खंडाळें नांवाचें गांव लागतें व येथूनच घाटास सुरुवात होते. आपल्यासमोरच<noinclude></noinclude> 9scaz8830twvahvlxg04jgm5y56tubs पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१५ 104 81371 233185 232760 2026-07-15T12:17:49Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233185 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१०|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>काळीभोर व मध्ये मध्ये हिरवी अशी डोंगरांची रांग दत्त म्हणून उभी राहते. या रांगेच्या मधला एक सुळका तर फारच उंच व भयंकर दिसतो. सडक तर त्या सुळक्याकडे थेट जाते; व हा डोंगर आपण ओलांडणार कोठें, अशाबद्दल शंका उत्पन्न होते. इतक्यांत रस्ता डाव्या बाजूस एकदम वळतो व डाव्या बाजूस डोंगराची रांग बरीच सखल होत गेल्यामुळे इकडून ओलांडण्याची वाट आहे, असें वाटतें. पण डाव्या बाजूस बरेंच गेल्यावर रस्ता पुन्हां एकदम उजव्या बाजूस वळतो व मनुष्य त्या सुळक्याच्या अगदीं थेट खालीं येतो. येथून त्या सुळक्याची उंची, त्याचा प्रचंडपणा व त्याचा बिकटपणा यांची चांगलीच कल्पना मनांत येते. रस्ता उजवीकडे जात जात व वळणे घेत घेत डोंगराच्या माथ्यावर येतो. या घाटाचा चढाव कातरजपेक्षां थोडा जास्त आहे, असें आह्मांस वाटलें. कारण तो साडेतीन मैलांच्यावर आहे. ४३ मैलांचे पलीकडे आह्मी गेलों तो रस्त्याला लागून डाव्या हाताला सुंदर पाण्याचें एक टांकें लागलें. तेथे अर्थात् दगडाला शेंदूर फासून एक ह्मसोबा तयार केलेला होताच. तेव्हां या सुंदर ठिकाणीं बसून फराळ करावा असा आह्मीं बेत केला व त्याप्रमाणें बरोबरचें पाथेय काढले. 'भुकेला कोंडा व निजेला धोंडा' या म्हणीचा प्रत्यय आह्मांला येथे आला. आदल्या दिवशींची साधी व शिळीच झुणकादशमी आह्मांला कितीतरी गोड लागली व त्यावर त्या टांक्यांतील स्वच्छ व गार पाणी पिऊन आमचा आत्माराम गारेगार झाला व पुढच्या प्रवासास आह्मी ताजेतवाने झालों. पण येथेंच आह्मांला साडेआठ झाले. थोड्याच वेळांत घाटमाथा आला व आह्मीं आमच्या पायगाडीवर चढून पायगाडीस टांच मारून भराभर चालूं लागलों व थोड्याच वेळानें सपाटीवर आलों. खंडाळा घाटाच्या अलिकडील भाग रुक्ष आहे, तसा इकडे नाहीं. इकडचा भूमिभाग सुपीक व नयनमनोहर दिसला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंस शाळू, गहू, हरभरा, भुईमूग इत्यादि पिकांचा हिरवागार निळसर किंचित् धूसर रंगाचीं शेतेंच्या शेतें लागलीं. यंदां जिकडे तिकडे पाऊस पुष्कळ पडल्यामुळे पिकें विशेषच जोमांत दिसली. अठ्ठेचाळीस मैलांच्या सुमारास<noinclude></noinclude> 34pes31s14kg4sqkasztuhfesuegq4m पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१६ 104 81372 233187 232761 2026-07-15T12:24:08Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233187 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|११}} {{rule}}</noinclude>सुकूल नांवाचें गांव लागलें. हें गांव बरेंच मोठे आहे व येथूनच वाईकडे उजव्या बाजूस वाट फुटते. वाई येथून फक्त ८ मैल आहे. आतां आह्मांला पुढे एकवीस मैल जावयाचें होतें व नऊ तर वाजून गेले होते. तेव्हां साताऱ्यास पोंचण्यास अकरा साडेअकरा वाजणार असें वाटलें. हा प्रांत बराच सपाटीचा आहे. यामुळे आमचा प्रवास जोरानें चालला होता. पन्नास मैलांनंतर वाठारकडून वाईला जाणारा रस्ता आह्माला लागला. येथूनहि वांई आठच मैल आहे. पुढे एकदां साताऱ्याकडून वाईचा रस्ता लागला तेथूनहि वाई आठच मैल आहे. यावरून पुणे- सातारा रस्ता या ठिकाणीं कांहींसा वर्तुलाकार असावा म्हणून वाई या तिन्ही रस्त्यांपासून आठच मैल आहे.<br> {{gap}}पुण्यापासून छपन्न मैलांशीं भुंजगांवाजवळ कृष्णा नदीवरील पूल लागला. या ठिकाणीं नदी फारशी मोठी नाहीं. नीरेच्या पुलापेक्षां हा पूल बराच लहान आहे. सातारारोड स्टेशनापासून साताऱ्यास येतांना कृष्णेवर जेवढा पूल आहे, तेवढाहि हा पूल नाहीं. यामुळें प्रथमतः हा पूल कृष्णेवरचा आहे हें ध्यानांतहि येत नाहीं. येथून पुढे एकसष्टमैलांजवळ असलेल्या लिंबगांवच्या खिंडीपर्यंत चढावाचा रस्ता आहे. आतां ऊनहि झाले होते यामुळे प्रवासाचा फारच त्रास झाला. तहानहि फार लागू लागली. मग वाटेंत एका ठिकाणीं चांगलीं पिकलेली केळीं घेतली व तीं खाल्लीं. त्यामुळे जरा बरें वाटलें. ही लिंबची खिंड व येथला एकंदर देखावा पुणे-लोणावळें रस्त्यावरील वडगांवच्या खिंडीसारखा दिसतो. लिंबच्या खिंडीच्या माथ्यावर कसेबसे आह्मीं आलों व तेथून पुन्हां जी उतारास सुरुवात झाली ती आह्मांस वेण्या नदीच्या पुलापर्यंत पुरली. वेण्येचा पूल पुण्याहून सदुसष्टाव्या मैलाजवळ आहे. आतां सातारा दोन अडीच मैलच राहिला. एकदांचे मुक्कामाला आलों, असे आह्मांस वाटूं लागलें. पण सातारा उंचावर असल्यामुळे या दोन अडीच मैलांला वाजवीपेक्षां जास्त वेळ लागला. तरी शेवटीं एकदांचे सातारा गांवाकडे जाणाऱ्या रस्त्याशीं आह्मी येऊन पोंचलों व गांवच्या रस्त्याला लागलों. गांव चढत्या किल्ल्याच्या बाजूवरच बसलेला असल्या-<noinclude></noinclude> 156s9ovz1wk9dow5qoo4tmet1fut12c पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१७ 104 81379 233188 232762 2026-07-15T12:28:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233188 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२|सज्जनगड व समर्थ रामदास.|}} {{rule}}</noinclude>मुळें आह्मांस गांवातून चालतच जावें लागलें. शेवटीं बाराच्या सुमारास आमच्या मित्राच्या घरीं आह्मीं सुखरूप येऊन पोंचलों. आह्मी पुण्याहून पायगाडीनें आलों, हें पाहून माझ्या मित्राच्या मंडळींना साश्चर्य आनंद वाटला.<br>{{gap}}रात्रीं आह्मीं आमच्या मित्राचें पुनर्विवाह या सामाजिक विषयावरील नाटक पहावयास गेलों. साताऱ्यासारख्या शहरीं पुनर्विवाहासारख्या सामाजिक विषयावरील एका कर्त्या सुधारकानें लिहिलेले नाटक पाहण्यास पुष्कळ प्रेक्षक जमावे हें स्वाभाविक होतें. मंडळीनें एकंदरींत प्रयोग चांगल्या प्रकारें केला, यांत संशय नाहीं. मात्र नाटक मोठे असल्यामुळे प्रयोग संपण्यास रात्रींचे तीन वाजले.<br> {{gap}}दुसरे दिवशीं आह्मांला उठण्यास उशीर झाला व सज्जनगडास दोन प्रहरनंतर जाण्याचे ठरलें. या वेळीं माझ्याबरोबर चारजण आणखी पायगाडीवाले होते. साताऱ्याहून सज्जनगड सहासात मैल आहे. तेव्हां चार वाजतां निघून सात साडेसात वाजतां आह्मीं सहज परत येऊ, असा आमचा अंदाज होता. सातारा शहर हे किल्ल्याच्या पायथ्याशी आहे, हें वर लिहिलेच आहे. पण हा किल्ल्याचा डोंगर म्हणजे एकटाच सुळका नाहीं, तर ही एक पूर्वपश्चिम जाणारी डोंगराची रांगच आहे व या रांगेत एकीकडे सातारचा किल्ला आहे व दुसरीकडे यवतेश्वराचा डोंगर आहे व सातारच्या किल्ल्यावरून यवतेश्वराच्या डोंगरावरून डोंगरांच्या पठारापठारानें महाबळेश्वरापर्यंत पायवाट जाते. सातारचा किल्ला व यवतेश्वराचा डोंगर यांचेमध्यें डोंगरांची रांग सखल असून खिंडीसारखी तुटली आहे व या खिंडीचे खालीं लहानसा बोगदा केलेला आहे व पुणे-कोल्हापूर रस्ता या बोगद्यांतूनच गेला आहे. बोगद्याच्या डाव्या हातास कोल्हापुरचा रस्ता वळतो व उजव्या हातास सज्जनगडाचा रस्ता फुटतो. साताऱ्याशेजारचा बोगदा टाकल्यावर मात्र मैल दीड मैल खूब उतार लागतो; व येथपर्यंतच रस्ता चांगला खडीचा आहे. पुढला रस्ता नुसत्या मुरमाचा आहे, व त्याला भयंकर चढउतार आहेत. कारण, उजव्या हाताच्या यवतेश्वराच्या डोंगरांतून कितीतरी ओढेनाले खाली<noinclude></noinclude> qmgrwtiyinkgfdelamh8aayem98ztcy पान:सज्जनगड व समर्थ रामदास.pdf/१८ 104 81383 233189 232763 2026-07-15T12:32:44Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233189 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सज्जनगड व समर्थ रामदास.|१३}} {{rule}}</noinclude>येऊन ते उरमोडी या नदीला जाऊन मिळाले आहेत. परळीच्या मैल दीड मैल अलीकडे उरमोडी नदी लागते. या नदीला अगदी अरुंद असा लांकडी साकू बांधलेला आहे. त्यावरून पायगाडी जेमतेम आह्मी नेली. पुढे हा रस्ता परळी गांवाकडे जातो. परळी किल्ल्यास जाण्याकरितां हा रस्ता टाकून अर्धा एक मैल अगदीं खांचखळग्याच्या पाऊलवाटेनेंच जावें लागतें, यामुळे सज्जनगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीशीं येईतों पांच वाजून गेले होते. तेथे एका शेतकऱ्याच्या गोठ्यांत आह्मी आपल्या पायगाड्या ठेवल्या व किल्ला चढण्यास लागलो. प्रथम एक लहानशी टेकडी चढून गेल्यावर किल्ल्याचा सुळकाच्या सुळका लागतो. हा किल्ला फार मोठा नाहीं. पण किल्ल्याच्या सभोवारचे काळेकभिन्न खडकच अगदी भिंतीसारखे तुटलेले आहेत. पूर्वी या किल्ल्याला जाण्यास चांगल्या पायऱ्या असाव्यात असें वाटतें. कारण, पायऱ्यांच्या खुणा सारख्या दिसत होत्या. या परळीच्या किल्ल्याची वाट व पायथ्यापर्यंतची वाट या पाहून मला देहूच्या वाटेची आठवण झाली. देहूची तीनचार मैलांची वाट अशीच अगदीं वाईट आहे. या दोन्ही ठिकाणीं मोठमोठ्या यात्रा जमतात. परळीला दासनवमीस सात हजारपर्यंत यात्रा जमते, असें मला समजलें. शिवाय साताऱ्याहून सज्जनगडास वारंवार जाणारे लोक पुष्कळ असतात. असे असून या वाटेची इतकी वाईट स्थिति कां? लोकलफंडाकडून या यात्रेकरूंनी चांगली वाट करण्याबद्दल दाद लावून घेऊं नये काय, असें माझ्या मनांत आलें. निदान किल्ल्याची वाट तरी चांगली कां नसावी? रामदासांच्या समाधीचें ठिकाण हे. रामदासांच्या वडीलबंधूंचे वंशज हयात असून महाराष्ट्रांतले पहिल्या प्रतीचे सरदार आहेत. चाफळकरांना मोठी जहागीर आहे. शिवाय रामदासी पंथाची शिष्यशाखाही मोठी आहे. तेव्हां या सरदारांनीं किंवा त्यांच्या शिष्यांपैकीं संपन्न गृहस्थांनी किल्ल्याचा रस्ता दुरुस्त करून लोकांना चढतांना सुखदायक होईल असा कां करूं नये? अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनांत वारंवार येत होते, इतकी या सर्व रस्त्याची वाईट स्थिति होती. शेवटीं सहा साडे सहाच्या सुमारास आह्मीं एकदांचे सज्जन-<noinclude></noinclude> c5fiug0c0buj9v6ogkvdvt05l8ube02 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१२ 104 110912 233190 232889 2026-07-15T12:39:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233190 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{x-larger|{{center|'''प्रकरण १२ वें.'''}}}} {{rule|7em}} {{center|'''गया व सारनाथ'''}} {{gap}}{{x-larger|'''गौ'''}}'''तमबुद्धाच्या''' पदस्पर्शाने पवित्र झालेलीं अशीं बौद्धधर्मीयांचीं स्थानें हिंदुस्थानांत व सिंहली दंतकथेप्रमाणें सिंव्हलद्वीपांत मिळून पुष्कळ आहेत. या स्थानांपैकी चार स्थानें पवित्रांतलीं पवित्र अशीं मानलेलीं आहेत. खुद्द गौतमबुद्धानें या चार स्थानांचें नियमितपणें दर्शन घेत जावें अशी आपल्या शिष्यांस आज्ञा केली होती. ती आज्ञा कितीतरी शतकें भाविकपणे पाळली जात असे व अझूनही पाळली जाते. तीं चार स्थानें म्हणजे गौतमबुद्धाचें जन्मग्राम '''कपिलवस्तु'''; साक्षात्कार स्थान '''गया'''; त्याचे आद्योपदेशस्थान '''ऋषिपतन किंवा मृगदाव''' (अर्वाचीन नांव सारनाथ); व त्याचें निर्वाणस्थान '''कुशिनारा''' (अर्वाचीन नांव काशीया) हीं तीं चार स्थानें होत. जेथें जेथें बौद्धधर्म पसरलेला होता त्या त्या दूर देशांहून पुरातन काळचा कष्टमय प्रवास करून भाविक यात्रेकरू हिंदुस्थानांतील या व इतर पवित्रस्थळीं येत असत हें आपलीं प्रवासवृत्त लिहून ठेवणाऱ्या '''फे हायन व हुएन सँग''' या चिनी यात्रेकरूंच्या उदाहरणांवरून दिसून येतें. कारण आपल्या प्रवासाचे वृत्त लिहून ठेवण्याचा खटाटोप न करणारे कितीतरी अज्ञात यात्रेकरू या दीर्घकाळामध्यें येऊन गेले असले पाहिजेत. अशा या पवित्र स्थानांपैकीं '''गया व सारनाथ''' हीं दोन स्थानें मी ता. ३ व ४ एप्रिल सन १९३५ या दोन दिवशीं लागोपाठ पाहिली. तरी त्या स्थानांचें यथाक्रम वर्णन करतों.<br>{{gap}}गया हे ठिकाण काशीच्या थेट पूर्वेस असून तें काशीपासून सुमारें सवाशें मैल अंतरावर आहे. मी गयेस जाण्याकरितां ता. ४ एप्रिल रोजी पहांटेस चार वाजतां कँटोनमेंट स्टेशनवर आगगाडी गाठली. तिसऱ्या<noinclude></noinclude> h6h52exkhcm095s3qg3e4ro2tincr7x पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१३ 104 110988 233191 2026-07-15T12:42:53Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233191 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||गया व सारनाथ|१७३ }}</noinclude>क्लासचें भाडे दोन रुपये पांच आणे पडलें. लागलीच आगगाडी चालू झाली. थोड्याच वेळांत गंगेवरील प्रचंड डफरिन पूल वलांडून आमची गाडी मोंगल सराई या जंक्शन स्टेशनवरून थेट पूर्वदिशेनें चालू झाली. हा सर्व प्रांत विलक्षण सपाट व सफेत आहे. पण जसजसें पूर्वेकडे जावें तसतशी पाण्याची विपुलता व भूभागाचा हिरवळपणा जास्त प्रमाणावर दिसून येतो. तसेंच या भागांत शिंदीच्या व माडाच्या झाडांच्या राईच राई लागतात. प्रयागपासून काशीपर्यंत गंगापार प्रदेश हा निर्जल, निर्वृक्ष व म्हणूनच रुक्ष व उजाड असा भूमिभाग वाटतो तसा हा गंगेच्या दक्षिण बाजूचा भाग वाटत नाहीं. उलट हा कितीतरी नयनमनोहर वाटतो. काशीपासून गयेपर्यंत कितीतरी लहानमोठ्या नद्या व त्यांवरील पूल लागतात. या सर्व नद्या उत्तरवाहिन्या असून त्या गंगेला जाऊन मिळतात; कारण ओरिसा प्रांतांतील हजारी बाग जिल्ह्यामध्यें टेकड्यांची एक रांगच रांग आहे. आगगाडीमधून ती उजव्या हाताच्या क्षितिजावर कमीअधिक स्पष्टपणें सारखी दिसत असते. अर्थात् भूभागाला दक्षिणोत्तर असा उतार आहे व म्हणून या भागांतील सर्व लहानमोठ्या नद्या उत्तरवाहिन्या आहेत. गया स्टेशन येण्यापूर्वी अशा तीनचार नद्या व त्यांवरील पूल आम्हीं ओलांडले. यांपैकी सर्वांत मोठी व आश्चर्यकारक नदी म्हणजे प्रख्यात शोण नदी होय. ज्याप्रमाणें एकाच महाबळेश्वर डोंगराच्या पूर्वपश्चिम पाणलोटापासून कोयना व सावित्री या दोन नद्या निघून कोयना कृष्णेशी संगत होऊन शेवटी बंगालच्या उपसागरास मिळते व सावित्री आरबी समुद्राला मिळते; त्याप्रमाणें शोण व नर्मदा या दोन नद्या अमरकंटक पर्वताच्या पूर्वपश्चिम पाणलोटापासून निघून शोण नदी गंगेशीं संगत होऊन शेवटीं बंगालच्या उपसागराला मिळते व नर्मदा आरबी समुद्राला मिळते. शोणनदीचे पात्र अत्यंत उथळ पण फारच रुंद आहे. नदीवरील पूल सुमारें दोन मैल लांबीचा आहे. मात्र तो गंगायमुनांच्या पुलांप्रमाणें उंच नाहीं. काय विलक्षण व आश्चर्यकारक येथला देखावा<noinclude></noinclude> ppfalfzumdprcs111gmef5b876q7rlj पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१४ 104 110989 233192 2026-07-15T12:46:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233192 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>आहे! सर्व नदीचें पात्र पांढऱ्या शुभ्र वाळूने भरलेले दिसलें. नदीचा प्रवाह किती वेळ तरी दिसलाच नाहीं. इतका तो लहान व बारिक धारेसारखा आहे. जिकडे पहावें तिकडे पांढराशुभ्र वालुकामय प्रदेश! जणूं कांहीं कोरड्या पडलेल्या समुद्राच्या अफाट वाळवंटामधून आगगाडी चालली आहे असा राहून राहून भास होत होता. गंगायमुना कांठचा सखल प्रदेश हा एका काळीं समुद्र होता असें भूगर्भशास्त्र सांगतें. या सिद्धांताचें प्रत्यक्ष प्रमाण या भूमिभागांतून जातांना पदोपदीं पटतें. कारण सर्व लहानमोठ्या नद्यांची पात्रें पांढरीशुभ्र वालुकामय असून सारखीच उथळ व रुंदच रुंद आहेत! शोणनदीचा व वालुकामय पात्राचा आश्चर्यकारक देखावा पाहून आम्हीं जरासें पुढे गेलों तो '''मरहर''' नदीचा तसाच देखावा दृष्टीस पडून माझें आश्चर्य द्विगुणित झालें. ही नदी जरी शोणनदीपेक्षां लहान आहे तरी दोन्हीच्या देखाव्यांत फार सारखेपणा आहे. '''मरहर''' नदी टाकल्यावर आणखी एक तशीच नदी लागली. मग लवकर '''गया''' स्टेशन आलें. घड्याळांत पहातों तो बरोबर नऊ वाजून अठरा मिनिटें झालीं होतीं. म्हणजे काशीपासून गयेस पोहोंचण्यास आम्हांस बरोबर पांच तास लागले असें दिसून आलें.<br>{{gap}}माझ्याजवळ छोट्या हँडबागेखेरीज कांहीं एक सामान नव्हतें. तेव्हां तिकीट देऊन मी स्टेशनबाहेर आलों व टांगा ठरवून लागलीच सात मैलांवर असलेल्या बुद्धगयेस जाण्यास निघालों. कारण स्टेशनची गया ही हिंदु लोकांना पवित्र असून तिला मातृगया म्हणतात. ती स्टेशन- शेजारींच असल्यामुळे मागाहून पहावयाची व सायंकाळच्या गाडीनें परत काशीस जावयाचें असा मी काशीहून निघतांना बेत केला होता. तेव्हां मी तडक गयेस चालू झालों.<br>{{gap}}मातृगया व बुद्धगया हीं दोन्हीं गांवें उत्तरवाहिनी '''फल्गु नदी''' हिच्या पश्चिम किनाऱ्यावर आहेत व मागे सांगितल्याप्रमाणें त्यांमध्यें सात<noinclude></noinclude> hmkbbsrtpvjxkkpamfoec1zl56a4rot पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१५ 104 110990 233193 2026-07-15T12:51:19Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233193 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||गया व सारनाथ|१७५ }}</noinclude>मैलांचे अंतर आहे. रस्ता फारसा चांगला नाही. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंस सारखी झाडी आहे. आंब्याची शिंदीचीं व नारळाची झाडे आहेत. यामुळे रस्ता नेहेमीं छायाच्छादित व म्हणून गार असतो डाव्या अंगास सारखी फल्गु नदी दिसत असते. तिला पाणी मुळींच नाहीं. सर्व नदीचे पात्र म्हणजे पांढराशुभ्र वालुकामय समुद्रकिनाराच होय असा भास होतो. ही नदी निर्जल पाहून मला सप्त शल्ये सांगणाऱ्या सुभाषिताची आठवण झाली. तरी हा भूमिभाग सुपीक व विपुल पाण्याचा दिसला कारण आमच्या उजव्या हातांस हिरवीहिरवीगार शेतें दिसत होतीं व शेतांना छोट्या व उथळ विहिरीवजा डबक्यांतून उक्तीनें पाणी देण्याची व्यवस्था केलेली दिसली. या भागांत खायच्या आळवाची दाट दाट शेते पाहून मला आश्चर्य वाटलें. पण शोधाअंती कळले की, इकडे आळवाच्या आळकुड्या या मोठ्या प्रमाणावर पिकवितात व तें एक शेतीचे मोठें उत्पन्न आहे. कारण या आळकुड्या वाळवून त्याचें पीठ करतात व त्याचा भाकरी तुकडा करून गरीब लोक व मध्यम स्थितींतील लोकसुद्धां उपवासाकरितां खातात. फल्गु नदी ही नीलांजन व मोहन या दोन नद्यांच्या संगमानें झालेली आहे व बुद्धगया हे गांव संगमाचें खालींच आहे. यामुळे गांवाच्यानजीक आलों तो दोन नद्यांची पात्रें दुरून दिसूं लागलीं व लगेच गांव आलें व माझा टांगा एका झाडाच्या छायेत थांबला.<br>{{gap}}हें गांव अगदींच लहान दिसलें. आमचा टांगा उभा होता त्याचे समोरच एका मोठ्या तटवजा उंच भिंतीनें व प्रचंड फाटक ने शोभायमान झालेला मोठा वाडा दिसला. तो वाडा गयेच्या हिंदू महंताचा आहे असें समजलें. जरी हें स्थान खरोखरीं बौद्धधर्मीयांचे आहे तरी तें हिंदू महंताचे ताब्यांत आहे असें कळलें. आमचा टांगा थांबला त्याचे पुढें टेकडीवजा बराच मोठा उंचवटा आहे. तिकडेच बुद्धाचें देऊळ आहे असें समजल्यावरून मी चालतच त्या उंचवट्याचे माथ्यावर गेलों तोंच डाव्या हातास खोल खोल पायऱ्या लागल्या व बुद्धगयेतील पवित्रस्थान एकदम दृग्गोचर झालें. पायऱ्या उतरून खालीं गेलों तोंच उजव्या<noinclude></noinclude> g8qyivie5plvfq6fxx394joayfge078 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१६ 104 110991 233194 2026-07-15T12:55:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233194 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७६|काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>हातास छोटे छोटे स्तूपच स्तूप दिसले व पलीकडे मोठा थोरला पिंपळ वृक्ष दिसला. पण तिकडे न वळतां मी प्रथम बुद्धमंदिराकडे गेलों. हें मंदिर बरेंच पुरातन काळचें असावें असें त्याच्या साध्या पण फार काळवंडलेल्या दगडी कामावरून वाटलें. देवळासमोर लांब सभामंडप होता त्यांतून मी आंत गेलों. सभामंडप साध्या व बिननक्षीच्या बांधणीचा आहे. शेवटीं गाभाऱ्यासारखा भाग असून तेथें बुद्धाची ध्यानस्थ मूर्ति आहे. या मुख्य देवळाच्या डाव्या बाजूस दोनतीन पायऱ्यांचे जोतें असलेली सोप्यावजा ठेंगणी इमारत आहे व त्यांत निरनिराळ्या हिंदू देवांच्या मूर्ती आहेत. येथें बैराग्यासारखे दिसणारे पुजारी बसलेले असून ते देवापुढें पैसे ठेवण्यास सांगत होते व पैसेही मागत होते. बुद्धाच्या देवळांत मात्र कोणी पैसा मागितला नाहीं. हा एक बुद्धधर्माचा मला विशेष वाटला! नंतर मी मुख्य देवळाच्या डाव्या बाजूनें गेलों. तेथेंच पायऱ्या उतरतांना दिसलेले छोटे छोटे स्तूप लागले. ते फार तर छातीभर उंच असतील. अशोक कालीन व त्यानंतर बांधलेलें प्रचंड स्तूप व आश्चर्यकारक कारागिरीचें स्तूप पाहिल्यावर छोटे व साध्या बांधणीचे स्तूप पाहून मला बौद्धधर्माच्या पहिल्या साध्या व शुद्ध स्वरूपाची आठवण झाली. मगध देशाच्या राजांनी बौद्धधर्म स्वीकारल्यावर त्याला राजवैभव व संपन्नता आली. मग बुद्धाच्या अवशेषावर प्रेक्षणीय स्मारके बांधण्यांत आलीं व बुद्ध साधूंकरितां विहार व प्रार्थनेकरितां व धर्मप्रवचनांकरितां चैत्यगृहे बांधण्यांत आली. पण बुद्ध-गया येथें बुद्धधर्माच्या प्रारंभींची साधी बांधकला पद्धति राहिला असली पाहिजे अशी माझ्या मनांत कल्पना उभी राहिली. या साध्या स्तूपाकडे पहात पहात मी पिंपळवृक्षाजवळ गेलों. हा वृक्ष बराच मोठा असून त्याला मोठा पार बांधलेला आहे. याच पिंपळवृक्षाखालीं ध्यानस्थ बसला असतांना बुद्धाला ब्रह्मसाक्षात्कार झाला. त्याचे पश्चात् अशोकाच्या मुलीने याच पिंपळाची एक शाखा लंकेमध्ये नेली व ती '''अनुराद्धपूर''' येथे मोठ्या समारंभानें जमिनीत लावण्यांत आली. तेथें त्याचा वृक्ष होऊन तो आजतागाईत<noinclude></noinclude> fst7zzbunlwqxt1yi5cbvv6ps4fhxzl पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२१९ 104 110992 233195 2026-07-15T12:59:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233195 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||गया व सारनाथ|१७७ }}</noinclude>तेथें आहे. अडीच हजार वर्षे हे दोन्ही वृक्ष कसे जगले असतील ही शंका चिकित्सक माणसाला आल्याखेरीज रहात नाहीं! पण भाविक- बुद्धांची श्रद्धा तरी अशी आहे कीं, बुद्धाच्या साक्षात्काराच्या काळचा हा पिंपळ वृक्ष आहे! बुद्धाला या पिंपळ वृक्षाखालीं ज्ञान झालें म्हणून या वृक्षाला बौद्धधर्मी लोक '''बोधिवृक्ष''' म्हणूं लागले व हा वृक्ष त्यांना अत्यंत पवित्र वाटूं लागला. जागोजाग असे वृक्ष लावावे व त्यासभोवार पार बांधून तेथें बुद्धाची मूर्ति ठेवावी व त्याचें जातां येतां दर्शन घ्यावें अशी पद्धति पडली. जेथें जेथें बौद्ध धर्माचा प्रसार झाला तेथें तेथें ही चाल पडली व आज तागाईत सर्रहा चालू आहे. म्हणून लंकेसारख्या बेटामध्यें व कोलंबो सारख्या युरोपियन धर्तीच्या शहरामध्यें सुद्धां रस्त्याच्या चवाठ्यावर पिंपळाचे पार व पिंपळाची झाडे दृष्टीस पडतात. हिंदुस्थानांत पिंपळाला पार बांधण्याची पद्धत आहे. ती हिंदु धर्मीयांनी बौद्धांपासून उचलली असावी कीं काय अशी शंका माझ्या मनांत उभी राहिली. याप्रमाणें त्या पुरातन पिंपळ वृक्षापुढे उभा असतांना बौद्ध धर्माचा वाचलेला व पाहिलेला बहुविध इतिहास माझ्यापुढें मूर्तिमंत उभा राहिला!<br>{{gap}}हे पाहून झाल्यावर पायऱ्या चढून मी पुनः पठारावर आलों व मग तांबड्या विटांचें नवीन बांधलेलें दुमजली यात्रेकरूंचे घर पाहिलें. तेथें तीन चार बौद्ध भिक्षू राहात होते. झालें, बुद्ध गया येथें अधिक पाहण्यासारखें कांहीं नाहीं असें कळल्यावरून मी परत टांग्याशीं आलों; व मग त्या भागांतील निसर्गरमणीय देखाव्याचें पुनदर्शन पण शेवटचें दर्शन घेत तडक गया स्टेशनला आलों.<br>{{gap}}गया हे जिल्ह्याचें ठिकाण असून पुष्कळच मोठें शहर आहे. त्याची लोक संख्या सुमारे पाऊण लाख आहे. या शहराचे दोन भाग पडले आहेत. एक खुद्द गया; हीच हिंदु लोकांची प्रख्यात मातृगया किंवा विष्णुगया; व दुसरा साहेबगंज; यामध्यें कचेऱ्या, कोर्टे, शाळा इत्यादि पुष्कळच सरकारी इमारती आहेत. शहराची व्यापारपेठ<noinclude><br>{{gap}}१२</noinclude> t5zacp37buw3bixxn5p0kpb57tmxw4l पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२० 104 110993 233196 2026-07-15T13:02:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233196 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७८ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>याच भागांत आहे. शिवाय मोठमोठ्या लोकांचे बंगले याच भागांत आहेत. स्टेशनच्या जरा पलीकडे व साहेबगंजला लागून एक बरीच उंच टेंकडी आहे. त्या टेंकडीच्या पायथ्याशीं व टेंकडीच्या माथ्यापर्यंत व माथ्यावर सुद्धां दाट वस्ती आहे. हीं बहुतेक वतनदार गयावळांची व भटाभिक्षुकांची वस्ती आहे. शहराचे दोन्ही भाग अगदीं एकमेकांना भिडलेले आहेत; इतकें कीं प्रवाशास ते निरनिराळे ओळखतां येतच नाहींत. तसेंच या शहराची वस्ती इतकी दाट व एकेठिकाणी केंन्द्रीभूत झालेली आहे कीं, पाऊण लाख वस्तीचें हें शहर असेल असे मला केव्हांही वाटलें नाहीं. अर्थात् असें दाट व केंन्द्रीभूत वस्तीचें शहर पायीं पायीं पहाणेंच मला पसंत पडलें व मी सर्व शहर व तेथली प्रेक्षणीय स्थळे नव्हे एकमेवाद्वितीय प्रेक्षणीय स्थळ विष्णुपद देवालय व फल्गू नदीचा घाट- पायीं जाऊन पाहिलीं. स्टेशनला लागूनच सरकारी सार्वजनिक इमारती लागल्या. त्या दिसण्यांत सुबक व बागबगीच्यांनीं मंडित अशा दिसल्या. नंतर बाजारपेठ लागली. येथली सर्व वस्ती व बांधणी मुसलमानी पद्धतीची दिसली. बहुतेक घरें व इमारती कमानदार असून सर्व घरांना व इमारतींना पांढरा शुभ्र रंग सर्वत्र दिलेला दिसला. यामुळे मुसलमानी मशिदी व कबरीच्या ठिकाणासारखा येथें देखावा वाटला. नंतर मी टेंकडी चढावयास लागलों. सर्व टेंकडीभर मोठमोठे वाडेच वाडे लागले. हे मजबूत व हिंदु बांधपद्धतीचें असून मालकांची संपन्नता व्यक्त करणारे आहेत यांत शंका नाहीं. हेच श्रीमंत गयावळांचे व त्यांच्या आश्रितांचे वाडे होत. येथल्या वजनदार गयावळांची गजांतलक्ष्मी आहे असें कळलें. यांनी फक्त 'तेरे पितर सरग भयो” म्हणावयाचे व त्याबद्दल यांत्रेकरूंकडून हवी तशी व मिळेल तितकी दक्षिणा लाटावयाची हा यांचा व्यवसाय! धर्मज्ञान अगर विद्वत्ता यांचे नांवानें आंवळ्या येवढे पूज्य! व्यावहारिक वागणूकही व्यसनीपणाची. तरी पण आमचा धर्मभोळेपणा इतका आहे कीं, अशा व्यक्तींकडून किंवा त्यांच्या वतीच्या भटजींकडून धर्मविधी करून घेतले<noinclude></noinclude> a7s26mro09bz62yp8kbw688rfrls3yu पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२१ 104 110994 233197 2026-07-15T13:06:43Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233197 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||गया व सारनाथ|१७९ }}</noinclude>म्हणजे पुण्यप्राप्ति होते व नरकांत पडलेले पितर स्वर्गास जातात अशी समजूत आहे. अशा प्रकारचे विचार ते गयावळांचे मोठमोठे वाडे पाहून माझ्या मनांत सारखे उभे रहात होते. टेंकडीचा चढाव बराच मोठा आहे पण शेवटी मी एकदांचा माथ्यावर आलो. येथें गयेंतील पवित्रांतलें पवित्र स्थळ- कारण पवित्र स्थळें छपन्न आहेत असें गयावळ सांगतात- '''विष्णुपद''' हे देवालय आहे. हे देवालय काशीच्या विश्वेश्वराप्रमाणेंच मुसलमानी अमदानीत उध्वस्त झालें होतें; पण मुसलमानी अंमलाच्या ऱ्हासानंतर व मराठे व शीख यांच्या राजकीय सत्तेच्या उदयानंतर ते बांधण्यांत आलें व तें अहिल्याबाईनें बांधलें असें कळलें. हे देऊळ काळ्या दगडाचें असून सर्व काम माठीव व मजबूत आहे. पण आश्चर्याची गोष्ट ही कीं, देवळाच्या गाभाऱ्यांत विष्णूची मूर्ति नाहीं, तर फक्त दगडी चबुतऱ्यावर विष्णूच्या पादुका आहेत. येथें मला रामेश्वराच्या गंधमादन पर्वतावरील देवळाची आठवण झाली. तेथेही मूर्ति नसतांना फक्त रामाच्या पादुकाच चबुतऱ्यावर बसविल्या आहेत व यात्रेकरू या पादुकांचीच पूजा करतात. गयेस अशीच स्थिति आहे. देवळाला लागून लहानसे सोपे आहेत. तेथें पिंडदानादि विधी चालू असलेले दिसले.<br>{{gap}}विष्णुपद पाहून झाल्यावर मी टेंकडीखाली आलों व मग टेंकडीच्या पायथ्याशींच असलेल्या फल्गू नदीच्या कांठीं गेलों. ही नदी म्हणजे निवळ वाळवंटच आहे! पाणी फारसे दिसलें नाहीं. पण या नदीच्या वाळवंटामध्ये मुंडनविधि करून श्राद्धविधि केले म्हणजे पितर स्वर्गाला जातात अशी समजूत असल्यामुळें येथेंच श्राद्धविधि करतात! नदीचें तें पांढरेशुभ्र अफाट पसरलेलें वाळवंट व शेजारींच ती दाट वस्तीची टेंकडी हा देखावा निसर्गरमणीय वाटला यांत शंका नाहीं. इतकें पाहून होत आहे तों सायंकाळ होत चालली म्हणून मी स्टेशनवर आलो. स्टेशनपासून अर्ध्या पाऊण मैलाच्या अंतरावर आणखी एक टेंकडी आहे; तेथें ब्रह्मयोनी म्हणून एक मोठी भेग आहे. त्यांत प्रवेश केला म्हणजे जन्ममरणापासून मनुष्य मुक्त होतो व तेथेही एक अक्षयवट<noinclude></noinclude> s6eyaxnq0lv5tnddxw5iut9q0dsfv9a सदस्य चर्चा:Aaviwaghma 3 110995 233198 2026-07-16T07:14:03Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 233198 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Aaviwaghma}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १२:४४, १६ जुलै २०२६ (IST) 15gev0qdvagqagxugdkxq8orveh67sm पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२२ 104 110996 233199 2026-07-16T11:13:59Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233199 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८० |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>आहे असे मला सांगण्यांत आलें. पण आगगाडीची वेळ भरत आली म्हणून मी त्या टेंकडीकडे किंवा अक्षयवटाकडे गेलों नाहीं. स्टेशनवर आगगाडीची वाट पहात बसलो. गाडी प्लॅटफॉर्मवर सायंकाळी सहा वाजतां आली व मी गाडीत बसलों व काशीस अवशीस एक वाजतां पोहोंचलों.<br>{{gap}}गया या स्थानाचें धार्मिक महात्म्य व अद्वितीयत्व दाखविणारी दंतकथा अशी आहे. गयासुर नांवाचा राक्षस तपश्चर्या करून इतका पवित्र झाला कीं, त्याच्या स्पर्शानें किंवा दर्शनानें लोक स्वर्गाला जाऊं लागले. यमाचें काम नाहीसे होऊन यमपुरी ओस पडली. तेव्हां यमानें देवांकडे तक्रार केली. देवांनीं गयासुराकडे येऊन त्याचा देह यज्ञाकरितां मागितला. त्यानें ती गोष्ट कबूल केली. तो हल्लीं गया जेथे आहे तेथे निजला. यमानें त्यांचे डोक्यावर एक मोठी शिळा ठेवली. तीच गयेची टेकडी! तरीसुद्धां गयासुर स्वस्थ राहीना. तेव्हां ब्रह्मदेवाने विष्णूची पुनः प्रार्थना केली व त्यानें आपल्या गदेनें गयासुराला गया येथें कायमचा स्थिर करून ठेवला. पण गयासुरानें वचन घेतलें कीं, माझ्या शरीरानें व्यापिलेली दहा मैल जागा (गया ते बुद्धगया येथपर्यंतचा भूमिभाग) पवित्र व्हावी. येथे देवांनीं सदा राहावें; याला गया क्षेत्र म्हणावें व येथें श्राद्ध करणाराचे पूर्वज स्वर्गास जावे!<br>{{gap}}या दंतकथेबद्दल राजेन्द्रलाल मित्र या प्रख्यात संस्कृत पंडिताचें मत असें आहे कीं, ही दंतकथा म्हणजे बौद्धधर्माचा पाडाव व हिंदुधर्माचें वर्चस्व या गोष्टीवरील एक रूपक आहे. बुद्धगया व मातृगया पाहिल्यानंतर राजेन्द्रलाल मित्रांचें मत सत्याला धरून असावें असें मला वाटलें.<br>{{gap}}भाविक बौद्ध यात्रेकरूला बुद्धगया व सारनाथ ही स्थानें सारखीच पवित्र वाटली, तरी माझ्यासारख्या कला निसर्गप्रिय दृश्यदर्शकाच्या (sight-seer) दृष्टीनें या दोन स्थानांमध्यें जमीनअस्मानाचे<noinclude></noinclude> d49oerwk9rekxdgolbkd7u63p0rraov पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२३ 104 110997 233200 2026-07-16T11:16:45Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233200 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||गया व सारनाथ|१८१ }}</noinclude>अंतर आहे. बुद्धगया येथे फारसे पाहण्यासारखें नाहीं, तर सारनाथ येथें सर्वच प्रेक्षणीय आहे.<br>{{gap}}सारनाथ काशी शहराच्या उत्तरेस पांच मैलांवर आहे. पण हिंदु विश्वविद्यालयापासून सुमारें दहा मैल दूर पडतें. मी ता. ३ एप्रिल सन १९३५ रोजी सकाळी सात वाजतां टांगा करून निघालों तों सवा आठ वाजतां सारनाथ येथे येऊन पोहोंचलों. उत्तरेकडे वारणा नदीपर्यंत काशी शहराचाच भाग लागतो. मग मात्र हिरवीगार शेतें व बागा लागतात. रस्ता बऱ्यापैकी असून त्याचे दोन्ही बाजूंस सुंदर आंब्यांची झाडें लावलेलीं आहेत. त्यामुळे वाईच्या नजीकच्या रस्त्याची आठवण झाली. एका सावलीच्या झाडाखालीं टांगा थांबला व मी टांग्याबाहेर आलों; तोंच तांबड्या दगडाची नवीच सुंदर इमारत दिसली. हीच पुराणवस्तुसंग्रहालयाची सरकारी खात्यानें बांधलेली इमारत (museum) होय. ही इमारत मुद्दाम बुद्धविहाराच्या पद्धतीची बांधली आहे. सध्यां चौकांपैकी तीन दालने बांधलीं आहेत. तीन दालनी इमारतीपुढें हिरवीगार हिरवळ (lawn) केली आहे व खुजा भिंतीप्रमाणे दिसणारी झुडपांची कुंपण केली आहे. तांबडी लाल ती नवीन इमारत व त्याच्या समोरची ती साधी हिरवीगार बाग हा देखावा फारच मनोहर आहे व तो संग्रहालयामध्यें ठेवलेल्या अप्रतिम कलाकृतिनिधीच्या प्रसादचिन्हाप्रमाणं वाटला. संग्रहालयाचे व्यवस्थापक (curator) मिस्तर नागर नांवाचे तरुण गृहस्थ आहेत. त्यांना मी भेटलों व त्यांनी मला सर्व संग्रहालय सविस्तरपणें दाखविलें या संग्रहालयांत सारनाथ येथे सांपडलेल्या एकंदर ४००० वस्तू आहेत! त्या ख्रिस्ती शकापूर्वी तीनशे वर्षांपासून ते सन १२०० पर्यंतच्या काळच्या आहेत. त्या वेळीं सारनाथ या पवित्र स्थानाची जाळपोळ व नायनाट करण्यांत आला व सारनाथ हे पवित्र स्थान नामशेष झालें. त्याचा शोध प्रथमतः सन १९०४ मध्ये लागला. तेव्हांपासून पुराण वस्तुसंशोधन खात्यानें सर्व भूमिभागावरील सांठलेली माती व उकीरडा उकरून बुद्धकालीन विहारांचे व मंदिरांचे अवशेष<noinclude></noinclude> bsqzgw7lenbsanm52y547s5qgwoy9al पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२४ 104 110998 233201 2026-07-16T11:23:04Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233201 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८२ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>खुले केले व येथे सांपडलेल्या नानाविध वस्तूंची नव्या बांधलेल्या संग्रहालयांत कालक्रमानें मांडणी केली. येवढ्या मोठ्या संग्रहालयांतील वस्तूंचे सविस्तर अवलोकन थोड्या वेळांत होणें शक्य नसतें. यामुळे कांहीं थोड्या वस्तू बारकाईनें पाहून मग बाकींच्यावर ओझरती नजर टाकणें येवढेच दृश्यदर्शकाला शक्य असतें व तोच मार्ग मीं स्वीकारला. पण या संग्रहालयामधल्या पद्धतशीर मांडणीप्रमाणें कलाकौशल्याच्या दृष्टीनें अप्रतिम असलेल्या वस्तूंचा संग्रह इमारतीच्या मधल्या व मुख्य दिवाणखान्यांत केलेला आहे. ही दृश्यदर्शकाची मोठी सोय झालेली आहे.<br>{{gap}}या दिवाणखान्यांत पाऊल टाकल्याबरोबर प्रवाशाचें मन आकर्षण करणारी कलाकृति म्हणजे अशोक स्तंभाच्या माथ्यावरील (Capital) सिंहाची चौकडी होय. किती हुबेहुब या सिंहांच्या मूर्ती आहेत! त्यांकडे सारखे पहात रहावें असें वाटतें. या स्तंभाच्या Capital चें सर्वच काम कमालीच्या कलाकौशल्याचे आहे! हे कॅपिटल सात फूट उंच आहे. त्याचे तीन भाग पडतात. पहिला व खालचा भाग पैलूपैलूंचा असून तो घंटेच्या आकाराचा आहे. पैलू किती प्रमाणांत व सफाईनें खोदलेले आहेत! त्याचेवर चौकोनी चबुतऱ्यासारखा भाग आहे. त्या चौकोनी दगडाच्या मधोमध फार सुबक असें चक्र कोरले आहे. हें चक्र बौद्धधर्माचें चिन्ह होय. या चक्राचे बाजूस सिंह, हत्ती, घोडा व बैल अशा चार प्राण्यांची चित्रे खोदलीं आहेत व या चबुतऱ्याचे वर चारी बाजूंस चार पूर्णप्रमाण सिंहांचीं चित्र खोदलेलीं आहेत! खरोखरीं अशोकस्तंभाचा हा अलंकार म्हणजे हिंदुस्थानांतील कलाकौशल्याचा एक अप्रतिम मासला होय यात शंका नाहीं.<br>{{gap}}पुराण वस्तुसंशोधन खात्याचे प्रख्यात डायरेक्टर यांनी या कलाकृतीविषयी खालील उद्गार काढले आहेत:-<br>{{gap}}"They are wonderfully vigorous and true to nature and treated with that simplicity and reserve which is the keynote of all great masterpieces of plastic art.<noinclude></noinclude> 33hs3h13vomc1iysackeqjfoue7gmql पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२५ 104 110999 233202 2026-07-16T11:32:17Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233202 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||गया व सारनाथ|१८३ }}</noinclude>India certainly has produced no other sculpture equal to them."<br>{{gap}}या दिवाणखान्यामध्यें व्यवस्थेनें लावून ठेवलेल्या व सारनाथ येथें सांपडलेल्या कलाकृती सर्वच इतक्या सर्वोत्कृष्ट आहेत की, प्रत्येक कलाकृतीकडे सारखे पहात बसावेसें वाटतें. पण आपला मार्गदर्शक व आपलें घड्याळ आपल्याला पुढे पुढे ओढीत नेतें व नाइलाजानें आपल्याला पुढे जावें लागतें येथें बुद्धाच्या उभ्या बसलेल्या व ध्यानस्थ असलेल्या पुष्कळ मूर्ती आहेत. त्यांमध्यें बुद्धाला ब्रह्मसाक्षात्कार झाल्यावर त्यानें सारनाथ येथें जो पहिला धर्मोपदेश केला त्याचे निदर्शक असें एक चित्र आहे. हें चित्र सिंहाच्या चित्राप्रमाणें बौद्धकालीन मूर्तिकलेचा एक अप्रतिम मासला आहे यांत शंका नाहीं.<br>{{gap}}तिसरा एक अप्रतिम कलाकृतीचा मासला म्हणजे बुद्धाचा साक्षात्कारापूर्वीचा उभा प्रचंड पुतळा होय. हा पुतळा तांबड्या दगडाचा आहे! या पुतळ्याचें कामही विशेष वाखाणण्यासारखें आहे. पण या पुराणवस्तु- संग्रहालयामध्ये इतक्या प्रेक्षणीय वस्तू आहेत कीं, त्यांचें सविस्तर बारकाईनें अवलोकन करण्यास सारनाथ येथे दिवसचे दिवस घालविले पाहिजेत. पण माझ्यासारख्या दोन चार तासांच्या आत परत जाणाऱ्या प्रवाशाला सर्व कलाकृतीकडे ओझरती नजर टाकण्याखेरीज मार्ग नाहीं. मलाही तोच मार्ग स्वीकारावा लागला. पदार्थसंग्रहालय पाहून झाल्यावर आम्ही बाहेर आलों. पदार्थसंग्रहालयाचें मागेच सारनाथ येथील उकरून काढलेल्या भूमिभागांत जुन्या इमारतींचे अवशेष सांपडले आहेत, तिकडे आम्ही गेलों. तेथें गेल्यावर मला तक्षशीला व नुकत्याच पाहिलेल्या महिंजोदारो या स्थळांची आठवण झाली. सारनाथ येथें पूर्वकाळीं बुद्धधर्मी भिक्षूंची मोठीच वसाहत होती असें दिसतें. येथें एकंदर सात विहारांचे अवशेष सापडलेले आहेत. तसेंच या आवाराचे मध्यावर मुख्य मंदिर सांपडलेलें आहे. तसेंच येथें दोन स्तूप सांपडले आहेत. बहुतेक इमारती विटांच्या असाव्या असें<noinclude></noinclude> 1tvnmjlvz00emcizhyvlsuo14isag4y पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२६ 104 111000 233203 2026-07-16T11:38:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233203 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८४ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>अवशेषावरून दिसलें. मुख्य मंदिराचे काम फारच प्रेक्षणीय असले पाहिजे असे शिल्लक व मोडक्या तोडक्या त्याच्या भागावरूनही दिसून येतें. या मंदिरानजिक अशोकस्तंभाचे दोनतीन तुकडे पडलेले आहेत. इतक्या काळानंतर व वारा, पाऊस, थंडी, उन्हाळा इत्यादि नाशक कारणांना न जुमानतां राहिलेलें या स्तंभाचें गुळगुळीत पॉलिश विलक्षण नवलाचें वाटलें. स्तंभाच्या तुकड्याला हात लावला तो आरशाला हात लावल्याचा भास झाला. इतका पॉलिश करून दगड गुळगुळीत केलेला आहे!<br>{{gap}}सिंहाच्या मूर्तीनी अलंकृत असा हा अशोकस्तंभ सबंद मूळच्या चबुतऱ्यावर बसविलेला असतांना तो किती मनोहर व चित्ताकर्षक दिसत असला पाहिजे याची मला कल्पनासुद्धां करवेना. पण अशा या अप्रतिम स्तंभाचा धर्मवेडानें नायनाट केलेला पाहून माझें मन फार उद्विन झालें! पण तसेंच मन आंवरून मी पुढें पहात पहात चाललों व मग दृष्टीस पडणाऱ्या नानाविध वस्तूंनीं माझें मन वेधलें. सारनाथचा हा जुना उकरलेला भूमिभाग पाहून झाल्यावर आम्ही जरा उंचवट्याच्या जागेवर आलों व तेथें नवेंच बांधलेलें सुंदर तांबड्या दगडाचें देवालय पाहण्यास गेलों. या देवालयाचे काम फार प्रेक्षणीय आहे यांत शंका नाहीं. हें बुद्धमंदिर कलकत्त्याच्या महाबोधी सभेच्या वतीने बांधण्यांत आलें. या कामाचा पुढाकार सिलोनमधल्या प्रख्यात धर्मपाल नांवाच्या बौद्धधर्मी गृहस्थांनी घेतला. या देवळाला दीडदोन लाख रुपये खर्च आलेला आहे. ही रक्कम जपान, सिलोन, बर्मा इत्यादि देशांतून आलेली आहे व या रकमेचा मोठा भाग एका बौद्धधर्माबद्दल आदर वाटणाऱ्या इंग्रजी बाईकडून मिळाला आहे हें कळून तर माझें आश्चर्य द्विगुणित झालें. या सुंदर देवालयाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस संगमरवरी दगडावर, मिळालेल्या देणग्यांची यादी दिली आहे. देवालयाचा दिवाणखाना भव्य व प्रशस्त आहे. त्याचे भिंतीवर व वरच्या तक्तपोशीवर रंगाचें व चित्रे काढण्याचें काम चालू होतें. हे कामकरी खुद्द जपान<noinclude></noinclude> 4sb7gynsgowvg0yb9cd0zb6qmatp0oy पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२२९ 104 111001 233204 2026-07-16T11:47:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233204 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||गया व सारनाथ|१८५ }}</noinclude>मधून मुद्दाम आणविलेले असून बुद्धाच्या चरित्रांतील निरनिराळ्या प्रसंगांची चित्रे काढण्याचे काम त्यांचेवर सोपविलेले आहे असें कळलें. कमी अधिक पुरी झालेलीं सुंदर चित्रे भींतींवर व तक्तपोशीवर दिसत होतीं. देवालयांत ठेवलेली बुद्धाची मूर्ति प्रेक्षणीय आहे. एकंदर देवालयाचें सुबक व कलाकौशल्ययुक्त काम पाहून व त्याकरितां केलेला खर्च पाहून बौद्धधर्मीयांची धर्मभावना अझून जागृत आहे हे मला कळलें व दूरदूरच्या देशांमध्ये सुद्धां गौतमबुद्धाच्या आयुष्यांतील प्रसंगांशी निगडित असलेल्या स्थानांबद्दल अद्याप किती पूज्यबुद्धि आहे हे पाहून मला बुद्ध धर्माचें व त्याच्या अनुयायांचे मोठें कौतुक वाटलें.<br>{{gap}}याप्रमाणे सारनाथच्या पवित्र भूमीवर तीन चार तास घालवून मी टांग्यांत बसून परत काशीस येण्यास निघालों. परत येतांना अर्धामैल आलों तोंच एक स्तूप उजव्या हातास दृष्टीस पडला (जातांना हा दृष्टीस पडला तेव्हां परत येतांना तो पहावयाचा बेत केला होता) म्हणून तो पहाण्याकरितां उतरलों. या स्तूपाला तेथले लोक चौखंडी म्हणतात असे कळलें. कारण स्तूपावर चौकोनी बुरुज आहे. या स्तूपाची बुरुजा सकट उंची ८४ फूट आहे. हा चौकोनी बुरुज सन १५८८ मध्यें अकबर बादशहानें बांधला असें बुरुजावरील एका परशीयन लेखावरून दिसतें. या बुरुजाचे माथ्यावरून सभोवारचा विस्तीर्ण व चित्ताकर्षक देखावा दिसला. या सपाट प्रदेशामध्यें डोळ्यांत भरणाऱ्या गोष्टी म्हणजे उत्तर दिशेला सारनाथचा एक मोठा स्तूप व दक्षिणेस काशींतील औरंगझेबाच्या मशिदीचे बारीक मनोरे या होत. या मनोऱ्यांची मौज ही आहे कीं, या बुरुजावरून मनोरे दोन न दिसतांना एकच दिसतो. कारण पुढचा मनोरा मागच्या बरोबर आड येतो. म्हणजे बुरुज व दोन्ही मनोरे बरोबर एकाच सरळ रेषेमध्यें पडतात व म्हणून बुरुजावरून एकच मनोरा आहे असा भास होतो. येथून मी तडक बिऱ्हाडीं आलों. सारनाथाचें माझें दृश्यदर्शन येवढेंच. पण सारनाथ हे बौद्धधर्माचें फार मोठें प्रख्यात व पवित्र स्थान असून त्याची<noinclude></noinclude> ikh8ufjud9c6eg6a6ysm1px1ymljwfj पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३० 104 111002 233205 2026-07-16T11:51:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233205 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८६ |काशी - रामेश्वर यात्रा|}}</noinclude>पूर्वपीठिका फार पुरातन कालापर्यंत पोहोंचते. तरी तिच्याकडे आतां लक्ष देऊ या.<br>{{gap}}आधीं सारनाथ हे या पवित्र ठिकाणचे नांव अर्वाचीन आहे. पालीग्रंथाप्रमाणें हें स्थळ '''ऋषिपतन''' व '''मृगदाव''' किंवा '''मृगवन''' या दोन नांवांनी ओळखले जात असे व दोन्ही नांवांच्या निरनिराळ्या उपपत्या सांगितल्या आहेत. गौतमबुद्धाला ब्रह्मसाक्षात्कार होण्याचे जरा आधीं येथें एक ऋषि मरण पावला. म्हणून या स्थळाला ऋषिपतन म्हणू लागले. दुसरें नांव पडण्याची दंतकथा अशी आहे:<br>{{gap}}सारनाथ ज्या भूमिभागांत आहे तेथें पूर्वी मोठें वन होते व त्यांत गौतमबुद्ध आपल्या एका पूर्व जन्मीं हरणाच्या कळपाचा मुख्य असून या वनांत भटकत असे. त्याचा भाऊ देवदत्त हा हरिणरूपामध्ये दुसऱ्या कळपाचा मुख्य होता. काशीचा राजा या वनामध्ये येऊन हरणांची शिकार करी. आपल्या अनुयायांना अद्वातद्वा मारण्याऐवजीं दररोज एक एक हरिण राजाला नजर करण्याचे बोधिसत्वरूपी मुख्यानें कबूल केलें व तदनुरूप दोन्ही कळपांमधून एक दिवसाआड एक एक हरिण राजाकडे पाठविण्यांत येत असे. एके दिवशीं देवदत्ताच्या कळपामधील एका गाभण हरिणीची पाळी आली. तेव्हां ती बोधिसत्वाकडे गेली व तिनें बोधिसत्वास म्हटलें: 'मी मरण्यास तयार आहे. पण गर्भाशयांत असलेल्या अर्भकास मारणें अमानुष आहे.' हें म्हणणें बोधिसत्वाला पटलें व म्हणून गाभण हरिणीचे ऐवजीं बोधिसत्व स्वतः राजाकडे गेला. कळपाचा मुख्य राजवाड्यांत आलेला पाहून राजानें त्याला स्वतः मरणास तयार होण्याचे कारण विचारलें. मुख्यानें गाभण हरिणीची हकीकत सांगितली व तिची करुणा येऊन आपण स्वतः तिचे ऐवजीं आल्याचे सांगितलें. हें ऐकून काशीच्या राजाला पश्चात्ताप झाला व तो मुख्याला म्हणाला, "मी मनुष्यरूपी हरिण आहे; तूं हरिणरूपी मनुष्य आहेस;" तेव्हांपासून राजानें<noinclude></noinclude> js39hv7d0qfq76hfawgbii4dzddgxw9 पान:काशी-रामेश्वर यात्रा.pdf/२३१ 104 111003 233206 2026-07-16T11:57:33Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233206 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||गया व सारनाथ|१८७ }}</noinclude>हरिणाची हत्या बंद केली व तो भूमिभाग हरिणांकरितां राखून ठेवला, म्हणून त्या भागाला मृगवन किंवा मृगदाव म्हणूं लागले. ही दंतकथा विश्वसनीय असो नसो; इतकें खरें कीं, सारनाथाची भूमि गौतमबुद्धाला काशीच्या राजानें दिली व त्या ठिकाणीं बुद्धाने आपला पहिला धर्मोपदेश केला. तेव्हांपासून बाराव्या शतकापर्यंत सारनाथ हे बौद्धांचें प्रख्यात पवित्र यात्रास्थान बनलें. सारनाथ हे अर्वाचीन नांव सारंगनाथ (मृगांचा मुख्य) यापासून झालेलें असावें असा तर्क करण्यांत आला आहे. सारनाथ येथें बुद्धानें आपल्या वयाच्या पसतीसाव्या वर्षी म्हणजे क्रिस्ती शकापूर्वी ५२८ या वर्षी आपल्या पांच शिष्यांना आपला धर्मोपदेश केला व त्यांना तो उपदेश सर्व लोकांना सांगण्याकरितां निरनिराळ्या दिशांना पाठवून दिलें व स्वतः बुद्धही उपदेश करीत चालला. या धर्मोपदेशाला '''चत्वारी आर्य सत्यानी''' असें संस्कृतांत म्हणतात. या उपदेशाचा कोरलेला एक शिलालेख सर जॉन मार्शल यांना सारनाथच्या मुख्य देवालयानजिक सांपडला. या धर्मोपदेशामध्ये खालील मजकूर आहे:<br>{{gap}}दुःख, दुःखाचें कारण, दुःखाचा नाश व दुःखनाश करण्याचा मार्ग यांसंबंधीं तीं चार सत्य तत्त्वें आहेत. विषयसुखाच्या पाठीमागे लागणे हा खऱ्या सुखासमाधानाचा मार्ग नव्हे; तसेंच शरीर कष्ट करून तपश्चर्या करणें हाही खऱ्या सुखाचा मार्ग नव्हे. हे दोन्ही मार्ग त्याज्य आहेत. याच्या मधला मार्ग गौतमबुद्धानें शोधून काढला. तो मधला मार्ग म्हणजे अष्टविधा अभ्यास होय. या आठ गोष्टी खालील होत:<br>{{gap}}"सम्यक् श्रद्धा, सम्यक संकल्प, सम्यक् भाषण, सम्यक् कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक योग, सम्यक स्मृति व सम्यक् ध्यान."<br>{{gap}}हा पहिला धर्मोपदेश सारनाथ येथे केल्यामुळे सारनाथ हे बौद्धधर्माचें एक पवित्र यात्रास्थान बनलें. बुद्ध संघाला हें मृगवन मिळाल्यापासून येथें बुद्ध भिक्षू राहूं लागले. पण प्रथमतः ते साध्यां झोंपड्यांत राहात असत. सारनाथ येथे मोठमोठे स्तूप व विहार अशोकाने बांधले व<noinclude></noinclude> 0i66w3mky6y9xnkhhmkejbfko79x2ad