विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.11 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf 106 1874 233290 233274 2026-07-19T08:00:15Z कल्पनाशक्ती 3813 233290 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=[[स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ नवम खंड]] |Language=mr |Volume= |Author=विवेकानंद |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=न. म. कुलकर्णी |Address= |Year=१९२२ |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=V |Pages=<pagelist 4="अनुक्रमणिका" 5="हिंदु देवालय फोटो" 6="एक उघडे रहस्य" 19="कैवल्याचा मार्ग" 32="याज्ञवल्क्य आणि मैत्रेयी" 44="सांख्यविचार" 65="सांख्य आणि वेदान्त" 82="वेदान्त व हक्क" 107="हक्क" 118 ="अभ्यास" 141="भक्ति" 169 ="हिंदु चरित्रक्रमांतील वेदान्ताचे स्वरूप" 201="हिंदुस्थानांतील तत्त्ववेत्ते" 230="आपणांपुढील कार्य" 255="दानधर्म" 257 ="हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} cunqafb6igzcshzimtcppwf5zww4pcf पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५५ 104 66820 233289 155980 2026-07-19T07:52:21Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233289 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|{{xx-larger|'''दानधर्म.'''}}}} {{rule|7em}} {{gap}}(स्वामीजींचा मुक्काम मद्रास येथे असतांना 'चेन्नापुरी-अन्नदान-समाजम्' नांवाच्या संस्थेच्या वार्षिक सभेच्या प्रसंगी ते हजर होते. श्रोतृगणास स्वामीजींनी चार शब्द सांगावे अशी इच्छा प्रदर्शित केल्यावरून त्यांनी पुढील लहानसें भाषण केलें) <br>{{gap}}ब्राह्मणाला इतर जातींहून अधिक समजून आणि दानावर त्यांचा विशेष हक्क आहे असे समजून त्यांना इतर जातींहून अधिक दान कोणी करूं नये, असें एक विधान माझ्या पूर्वीच्या वक्त्याने केले आहे. अशा रीतीनें ब्राह्मणज्ञातीला विशेष हक्क देण्यात जशी एक वाईट बाजू आहे, त्याचप्रमाणे या गोष्टीची एक चांगली बाजू आहे हेहि लक्षात ठेवले पाहिजे. आज हिंदुस्थानांत जी काही संस्कृति दिसत आहे, तिचे मुख्य अधिष्ठान आजहि ब्राह्मण वर्ग हेच आहे. तत्त्ववेत्तेहि आज याच वर्गात आहेत. ऐहिकापलीकडे उडी मारून अदृश्य प्रदेशांत तत्त्वरत्नें शोधण्याचे काम प्राचीन काळी ज्याप्रमाणे मुख्यतः ब्राह्मणांनी केले, त्याचप्रमाणे तें काम अंशतः ब्राह्मणवर्गच करीत आहे. इतर ज्ञातींनी ब्राह्मणांना पोसले, म्हणूनच बुद्धि वाढीला लावण्यास ब्राह्मणवर्गाला अवकाश मिळाला. त्या वर्गाच्या चरितार्थाची साधने तुम्ही आज सर्वथा नाहींशी केली, तर साऱ्या राष्ट्राचेच मोठे नुकसान होणार आहे. त्या विशिष्ट वर्गाचे मोठेंसें नुकसान होईल असे नाही. आमच्या देशांत दान धर्माच्या कामी अविचार फार होतो, असा एक आक्षेप आम्हांवर आहे. परक्या देशांतील कायदेशीर दानधर्म पुष्कळांना मोठा पसंत पडतो. पण या दोन प्रकारांची परस्पर तुलना केली, तर त्याचे परिणाम मात्र अगदी अनपेक्षित स्वरूपाचे आढळून येतात. दाता स्वतःच्या खुषीने जे कांहीं देतो, तें घेऊन आमचा हिंदी उडाणटप्पू खूष होतो व निघून जातो. कमी अधिकाबद्दल तो तंटा करावयाचा नाही. दिले तेवढ्यांत संतोष मानून आपली जीवितयात्रा अगदी शांततेत तो घालवीत असतो. पण गोऱ्या उडाणटप्पूची गोष्ट याहून वेगळी आहे. कायद्याने निर्माण केलेल्या कंगालखान्यांत जाण्यास तो खुषी नसतो. कारण, तेथेंहि त्याचे हातपाय कायद्याने बांधलेले.<noinclude></noinclude> bm56mi4jj9f75aoda4sp8vbn0rs65c5 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५६ 104 66821 233291 156079 2026-07-19T08:03:50Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233291 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|दानधर्म.|२५१ }} {{rule}}</noinclude>बने तोपर्यंत आपले स्वातंत्र्य गमावण्याची इच्छा कोणासहि नसते. गोळाभर अन्नासाठी कायद्याच्या जाळ्यांत आपणांस बांधून घेणे, कोणासहि बरें वाटत नाही. कंगालखान्यांत जावयाचें नाही आणि बाहेर कोणाकडून काही मिळावयाचें नाही, अशा कैचीत सांपडलेल्या या गोऱ्या उडाणटप्पूने चोऱ्या करूं लागावें हे ओघासच आले. समाजाची सेवा तो करीत नाही, आणि स्वस्थ बसून खाण्याची सोय नाही. असे झाले म्हणजे तो समाजाचा शत्रु बनतो. समाजाला असे शत्रू निर्माण झाले म्हणजे सांपडेल तेथे आणि सांपडेल त्या रीतीने समाजावर ते प्रहार करीत सुटतात. मग त्यांच्या निवारणासाठी पोलिसांच्या तुकड्या हव्या, न्यायाधिकारी हवेत, कैदखाने पाहिजेत आणि बेड्या खोडेहि अवश्य पाहिजेत. संस्कृति या नांवाचा रोग मनुष्य जातीला जडलेला राहील, तोपर्यंत दारिद्र्य ही वस्तूहि असावयाचीच; आणि मग तिच्या निवारणासाठी उपायहि हवेतच. विलायती कायदेशीर निवारण आणि आमचें अनिर्बंध निवारण या दोहोंपैकी कोणता मार्ग बरा आहे हे तुम्हीच ठरवा. आमच्या इकडे संन्याशी बैराग्यांत तरी आमच्या पद्धतीचा मोठा दुरुपयोग होतो असे मला वाटत नाही. यांच्यांतील पुष्कळ लोक वैराग्यशील नसतील हे मला कबूल आहे. तथापि अन्न मिळविण्यासाठी आणि सोंगाच्या बतावणीपुरतें तरी धर्मज्ञान मिळविणे त्याला भाग पडते. ताकापुरतें रामायण सांगतां न आले, तर ताकहि त्याला मिळावयाचे नाही. पाश्चात्य देशांतील निवारणाचे कायदेशीर उपाय अमलात आणण्याकरिता केवढ्या तरी खर्चाची खाती समाजाला पोसावी लागतात; आणि या कंगालखान्यांतील मिरासदार कंगाल लोक कंगालखान्यांतून तुरुंगांत आणि तुरुंगांतून कंगालखान्यांत, अशा यात्रा करीत आपला जन्म काढतात. अशा स्थितीत या दोन पद्धतींपैकी बरी कोणती हे ठरविण्याचे काम तुमचें आहे.<br><br><Br>{{rule|5em}}{{rule|5em}}{{rule|5em}} {{nop}}<noinclude></noinclude> 69j6xrcqxqn0pm04xuw3o21tt9awo56 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५७ 104 66822 233292 156084 2026-07-19T08:08:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233292 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|{{xx-larger|'''हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.'''}}}} {{rule|7em}}{{rule|7em}} {{center|'''(लाहोर येथील व्याख्यान)'''}} {{gap}}पवित्र आर्यावर्तातील ही पवित्रतम भूमि आहे. ब्रह्मावर्त या नांवानें भगवान् मनूंनी जिचा उल्लेख केला आहे ती भूमी हीच. हे सारे दृश्य उल्लंघन करून त्यापलीकडे असलेल्या भूमीचा शोध करण्याची उच्चतम महत्त्वाकांक्षा प्रथम याच भूमीला झाली; आणि याच भूमीतून निघालेल्या ज्ञानगंगेच्या प्रचंड ओघाने सर्व जग पावन झाले. सर्व जगाला शांति देण्याचा मार्ग याच भूमींपासून झाला. या भूमीतील नद्या जशा मोठ्या, त्याचप्रमाणे तींत उत्पन्न होणारे ज्ञानप्रवाहही प्रचंड. या साऱ्या प्रवाहांचा संगम झाल्यानंतर जो झोत उत्पन्न झाला, त्याने हिंदुस्थानाचेच नव्हे तर साऱ्या जगाचे आक्रमण केले. त्याच्या भव्य नादाने दशदिशा दुमदुमून गेल्या. आर्यावर्तावर झालेल्या साऱ्या स्वाऱ्यांचा पहिला मोठा तडाखा याच भूमीने सहन केला आहे. आर्यावर्तावर स्वाऱ्या करणाऱ्या रानटी लोकांना शौर्याने प्रथम तोंड देणारी भूमी हीच. इतकी युद्ध आणि दुसरेहि नाना प्रकारचे ताप सहन करून ही भूमी अद्यापिहि क्षत्रियत्वाची खाण राहिली आहे. तिचे वैभव आणि सामर्थ्य ही अद्यापिहि शिल्लक आहेत. याच भूमीत श्रीनानकाचा जन्म झाला आणि जगाला त्यांनी प्रेमाचा मार्ग दाखविला. त्यांनी हिंदूंनाच नव्हे तर मुसलमानांनाहि आपले बाहु पसरून आलिंगन दिले. आपल्या प्रेममय अंतःकरणांत हिंदु आणि मुसलमान या दोघांसहि एकाच भावनेने त्यांनी ठाव दिला. याच क्षेत्रांत नानकाच्या मालिकेतील धैर्यशाली आणि उज्ज्वलकीर्ति गुरु गोविंदसिंग जन्मास आला. धर्मकार्यासाठी आपल्या स्वतःचा आणि आपल्या आप्तेष्टांचा बलि त्याने दिला. ज्यांच्या हितासाठी त्याने हे स्वात्मार्पण केले, ते त्यास सोडून गेले असतांहि त्या गोष्टीची दिक्कत न बाळगतां आपलें कार्य पुरे करून त्याने देशत्याग केला. घायाळ झालेल्या सिंहाप्रमाणे गुहेच्या एकांतांत त्याने देह विसर्जन केला. ज्यांनी ऐन प्रसंगी त्याजकडे पाठ फिरविली, त्यांजबद्दल मृत्युसमयींहि त्याने कुरकुर केली नाही. कोणाविरुद्ध एक शब्दहि मुखावाटे बाहेर पडूं न देतां शांत चित्ताने त्याने देहविसर्जन केलें.{{nop}}<noinclude></noinclude> 8iiahqnr34avmf508b4chhaxest85og पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५८ 104 66823 233293 156085 2026-07-19T08:12:41Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233293 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२५}} {{rule}}</noinclude>{{gap}}अशा प्रकारच्या या प्राचीन भूमीत मी तुम्हांसमोर आज उभा आहे. मोठा तत्त्वदर्शी अथवा गुरु म्हणून मी येथे आलों नाही. कारण गुरु होण्याइतकें ज्ञान मजपाशीं नाही. पाश्चात्य भागांतील आपल्या बांधवांस भेटून सुखदुःखाचे चार शब्द त्यांजपाशी बोलावे, इतक्याच हेतूने मी येथें आलो आहे. आपणां दोघांत भेद कोठे आहे हे पाहण्याकरितां नव्हे, तर कोणत्या मुद्यावर आपणांत एकवाक्यता आहे, हे पाहण्याकरितां मी आलो आहे. कोणत्या भूमिकेवर आपणांतील एकी कायम टिकेल हे जाणण्यासाठी मी आलो आहे. प्राचीनतम काळापासून ज्या तत्त्वांचा उच्च घोष आपल्या भूमीत झाला आहे, त्यांच्या पायावर आपली एकी दृढतर कशी होईल, हे जाणण्यासाठी मी येथे आलो आहे. परस्परांतील भेद वाढवून विनाशाची बीजे पेरण्याकरितां नव्हे, तर आपणां दोघांसहि एकजुटीने कोणतें विधायक कार्य करितां येईल, हे जाणण्यासाठी मी येथे आलो आहे. परस्परांनी परस्परांवर टीका करण्याचे दिवस आतां संपले. आता सर्वांचे एकमत कोठे होते, एवढेच पाहून एखादें संघटित कार्य करण्याची वेळ आली आहे. काही प्रसंगी अत्यंत कडक टीकेचीहि जरूर जगाला असते. पण अशी वेळ दीर्घ काळ टिंकणारी नव्हे. विशिष्ट प्रसंगापुरतीच ती असते; आणि प्रसंगाच्या समाप्तीबरोबर ही टीकेचेहि प्रवृत्ति समाप्त झाली पाहिजे. त्यानंतर चिरकाल टिकणाऱ्या सुसंघटित कार्यास सुरवात झाली पाहिजे. आपलें पाऊल पुढे पडण्यास टीकेचा आणि विनाशक कार्याचा उपयोग होत नसून, परस्परमदतीचा आणि विधायक प्रवृत्तीचाच उपयोग होत असतो. गेली शंभर वर्षे आपल्या या भूमीत टीकेचा पूर वहात होता. पाश्चात्य भौतिक शास्त्रांचा उज्ज्वल दीप झगझगीत पेटून त्याचा प्रकाश साऱ्या अंधाऱ्या जाग्यावर पडला. अगदी कोनेकोपरे आणि बिळेंसुद्धां लपून राहिली नाहीत; एवढेच नव्हे तर प्रकाशाच्या तीव्रतेने ती अधिकच स्पष्ट दिसू लागली. इतर चांगल्या वस्तू त्यामुळे मागे पडल्या. अशा स्थितीत मोठे मोठे बुद्धिमान् पुरुष जन्मास आले. सत्य आणि न्याय यांजबद्दल पूर्ण भक्ति त्यांच्या चित्तांत होती. स्वदेशाबद्दल त्यांच्या मनांत अत्यंत प्रेम होते, आणि विशेष हे की, ईश्वर आणि आपला धर्म यांजबद्दल त्यांच्या अंतःकरणांत भक्ति होती. या उत्कट भक्तीमुळेच आपल्या धर्मात आणि समाजरचनेत जी व्यंगें म्हणून त्यांना वाटली, त्यांजवर टीकेचा भडिमार त्यांनी उडवून दिला. अंत-<noinclude></noinclude> c58hl56nnl1qhxxzpexr3fztdybnfno पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२५९ 104 66824 233294 156086 2026-07-19T08:15:04Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233294 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>रात्म्यांतील अत्यंत दृढप्रेमामुळेच या गोष्टीला ते प्रवृत्त झाले. आपल्या देशाची कीर्ति उज्ज्वल व्हावी अशी खरी इच्छा त्यांच्या हृदयांत नसती, तर या भानगडींत ते कधीच पडले नसते. या भक्तिमान् पुरुषांचा यशोदुंदुभि आपण वाजवू या. कांही झाले तरी आपल्या कल्याणाचा मार्ग त्यांनी आपणांस दाखविला आहे. याकरितां त्यांना नमन करून पुढील कार्यास आपण लागले पाहिजे. हे टीकेचे दिवस संपले ही गोष्ट चित्तांत आणून, आतां संघटनात्मक कार्याची तयारी आपण केली पाहिजे. आजपर्यंत आपण एकमेकांचे दोष मात्र पाहिले आणि एकमेकांच्या उखाळ्यापाखाळ्याहि आपण काढल्या. आतां हे विनाशक कार्य बंद करून विधायक कार्यासाठी आपण एक झालें पाहिजे. टीकास्त्राने विस्कळित करून टाकलेल्या साऱ्या शक्ति आपण एकवटल्या पाहिजेत. गेली कित्येक शतके आपल्या देशाची प्रगति जागच्या जागीच राहिली आहे. तिचा गाडा आतां आपण पुढे ढकलला पाहिजे. आपल्या मोडकळीस आलेल्या घराची डागडुजी करण्याकरिता काही दिवस तें सोडून देऊन आपण वेगवेगळ्या ठिकाणी रहावयास गेलो होतो. आतां त्याची साफ सुफी होऊन तें रहावयास पुनः योग्य झाले आहे. आर्यांच्या वंशजांनों! तुमचा मार्ग आतां निष्कंटक झाला आहे. त्यावरून पुढे चालत जावयाचें इतकाच कार्यभाग आतां तुह्मांस करावयाचा आहे.<br>{{gap}}सद्गृहस्थ हो, या एकाच हेतूने प्रेरित होऊन मी तुम्हांसमोर आज आलो आहे; कोणत्याहि विशिष्ट पंथाचा, मताचा किंवा पक्षाचा मला अभिमान नाही, हे प्रारंभींच तुम्हांला सांगणे इष्ट वाटते. माझ्या दृष्टीने सारेच पंथ मला पूज्य आणि उपयुक्त वाटतात. ते सारेच सारखे मोठे आहेत. त्या साऱ्यांवरच माझे प्रेम असल्यामुळे त्यांत सत्यवस्तु कोणत्या रूपानें वास करते आणि त्यांत चांगला भाग कोणता आहे, हे शोधण्यांतच माझें सारें आयुष्य मी खर्च केले. याकरितां, आपलें एकमत कोठे आहे, ते शोधून काढून तेवढेच मुद्दे तुह्मांपुढे आज मी मांडणार आहे. अशा रीतीने काही सामान्य सिद्धांतांबद्दल ईशकृपेने आपणांत एकवाक्यता झाली तर त्याच्या पायावर पुढील इमारत रचण्याचे कार्य आपण सुरू करूं. जेथें तंट्याचे कारण नाहीं तेवढे सिद्धांत तरी प्रत्यक्ष सृष्टीत आणण्याचा यत्न करूं. आपण सारे हिंदु आहों. हिंदु हा शब्द कोणत्याहि वाईट अर्थाने मी वापरला नाही. यांत वाईट<noinclude></noinclude> q2owxzd3toncmevpnz0t0tpil8hmhp5 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६० 104 66825 233295 156087 2026-07-19T08:17:46Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233295 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२५५ }} {{rule}}</noinclude>अर्थाचा कांहीं ध्वनी निघतो असें कोणास वाटते; पण या म्हणण्यांत मला तथ्य दिसत नाही. सिंधुनदापलीकडे राहणारे ते हिंदु इतकाच अर्थ प्राचीन काळी होता. आपल्या द्वेष्ट्यांनी यांत आतां कांहीं वाईट अर्थ घुसडला असेल, पण नुसत्या नांवांतच काही विशेष अर्थ आहे असे नाही. हिंदु हा शब्द उज्ज्वल कीर्तीचा आणि पराविद्येचा दर्शक होणे अथवा तो गुलामगिरीत तुडविले गेलेल्या लोकांचा दर्शक होणे, हे सर्वस्वी आपणावरच अवलंबून आहे. आपण हल्लींसारखेच नास्तिक, निरुपयोगी आणि परावलंबी राहिलों तर हिंदु हा शब्द या दुर्गुणांचा द्योतक व्हावा, हे रास्तच आहे. सांप्रतकाळी या शब्दाला काही वाईट अर्थ आला असेल तर त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आणि त्याबद्दल वादही करीत बसू नका. कोणत्याहि भाषेचें सारें सामर्थ्य एकवटून उच्चगुणदर्शक शब्द निर्माण करावयाचे, तर तो शब्द हिंदु हा एकच होऊ शकेल असे आपण आपल्या कृतीने सिद्ध करूं या. जगांतील साऱ्या अत्युच भावना या एकाच शब्दांत सांठविण्याचे कार्य आपण करू या. आपल्या पूर्वजांबद्दल अथवा त्यांच्या कृतीबद्दल स्वतःस केव्हांहि लाज वाटू द्यावयाची नाही, हा माझा एक निश्चय सारा जन्म मी अबाधित राखिला आहे. जगांत कोणी अत्यंत अभिमानी मनुष्य असेल तर तो मी आहे. पण हा अभिमान माझ्या स्वतःबद्दलचा नसून माझ्या पूर्वजांबद्दल आहे हेहि तुम्हांस प्रांजलपणे सांगितले पाहिजे. प्राचीनकाळाचा अभ्यास जो जो मी करितो, तो तो माझा हा अभिमान वाढतच जातो. माझा हा अभिमान अस्थानी नाही, अशी खात्री अधिकाधिक पटत गेल्यामुळेच माझी बुद्धि निश्चित स्वरूपाची होते; आणि चव्हाट्यावर उभे राहून हे शब्द जगासमोर उच्चारण्याचे धैर्यहि मला प्राप्त होते. आपल्या पूर्वजांच्या चरित्राच्या अभ्यासामुळेच मी रजाचा गज झालो. ह्या आपल्या पूर्वजांनीच मला स्फूर्ति देऊन आपलें उच्च कार्य माझ्या हस्तें सुरू केले. तुम्ही त्याच आर्यांची मुलें आहां; आपल्या पूर्वजांबद्दल तुम्हांसहि असाच अभिमान उत्पन्न व्हावा अशी परमेश्वराची प्रार्थना मी करितों. तुमच्या पूर्वजांच्या ठिकाणी जी अचल श्रद्धा होती, तीच तुमच्या रक्तांत आणि रोमरंध्रांत पुनः खेळू लागो. ती तुमच्या जीवात्म्याशी एकरूप होवो आणि मुक्तिमार्ग साऱ्या जगासाठी मोकळा करण्याचे पुण्य तुम्हांस लाभो.{{nop}}<noinclude></noinclude> b51a25gqb8lqzqai7e304qki7i0it5g पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६१ 104 66826 233296 156088 2026-07-19T08:20:47Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233296 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>{{gap}}आपले सर्वांचे एकमत कोठे आहे याचा विचार करण्यापूर्वी आणखीहि एक मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला काही विशिष्टत्व म्हणून असते, त्याचप्रमाणे तें प्रत्येक राष्ट्रालाहि असते. 'देह तितक्या प्रकृति' ही म्हण राष्ट्रालाहि लागू पडण्यासारखी आहे. ज्याप्रमाणे दोन व्यक्ती एकसारख्या असत नाहीत, त्याचप्रमाणे दोन राष्ट्रहि एकसारखी असावयाची नाहीत. सृष्टिक्रमांत प्रत्येक मनुष्याला आपापलें नियत कार्य करावयाचे असते; आणि त्या कार्यपूर्तीला अनुरूप अशी त्याची मनोघटना असते. आपल्या पूर्वकर्माला अनुसरून पुढील क्रिया तो करीत असतो. चालू जन्माचा आपला कार्यक्रम त्याने पूर्वीच ठरवून टाकलेला असतो; आणि त्याला अनुसरून त्याच्या साऱ्या क्रिया घडत असतात. हाच नियम राष्ट्रालाहि लागू आहे. सृष्टीच्या व्यवहारांत प्रत्येक राष्ट्रालाहि काही नियतकार्य करावयाचे असते. या हेतूच्या पूर्तीसाठीच तें राष्ट्र जगत असते. हा नियम लक्षात घेऊन आपल्या राष्ट्राचें कार्य काय आहे, याचा विचार प्रथम केला पाहिजे. हिंदु मानवकुल कोणत्या हेतूनें जन्मास आले आहे हे प्रथम शोधून नंतर आपला कार्यक्रम आपण निश्चित केला पाहिजे. जगांतील राष्ट्रांच्या मालिकेत आपले स्थान कोणतें हे आपण प्रथम पाहिले पाहिजे. कांहीं सर्पांच्या डोक्यांत मणि असतात आणि ते नाहीसे होईपर्यंत त्या सर्वांना कशानेंहि मरण येत नाही, अशा कल्पित गोष्टी आपल्या लहानपणी आपण पुष्कळ ऐकल्या आहेत. त्याच प्रमाणे एखाद्या राक्षसाचा अथवा दैत्याचा मृत्यु एखाद्या ढोलीत राहणाऱ्या पोपटाच्या हृदयांत असतो, असल्या कथाहि आपण पुष्कळ ऐकल्या आहेत. अशाच प्रकारें राष्ट्राचाहि जीवनहेतु एखाद्या ध्येयाच्या मध्यबिंदूत एकवटलेला असतो. त्या राष्ट्राचे राष्ट्रीयत्व त्या ध्येयांत असते. हे ध्येय नष्ट होईपर्यंत त्या राष्ट्राला मृत्यूचे भय नाही. तें ध्येय शिल्लक आहे तोपर्यंत तें राष्ट्र अवनतावस्थेला पोचलेले असलें अथवा कितीहि मलूल झालेले दिसत असले, तरी तें मृत्युवश होणार नाही. हा सिद्धांत लक्षात घेतला म्हणजे इतिहासातील एका अपूर्व चमत्काराचा उलगडा आपणांस होतो. आपल्या या प्रिय भूमीवर रानटी लोकांच्या स्वाऱ्यांच्या लाटांवर लाटा येऊन आदळल्या. 'अल्ला हो अकबर' या आरोळ्यांनी कित्येक शतकें आकाशहि फाटून जात होते आणि कोणता क्षण आपल्या आयुष्याच्या अखेरचा होईल, हे कोणाहि<noinclude></noinclude> 3gct08z1mjkiy58ef4pnkb37gl01pq1 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६२ 104 66827 233297 156089 2026-07-19T08:24:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233297 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२५७ }} {{rule}}</noinclude>हिंदूला सांगवत नव्हते. जगांत जितके देश इतिहासांत नमूद आहेत, त्यांत परकीयांच्या पायांखाली इतका एकसारखा तुडविला गेलेला देश एकहि नाही. या देशाने जितकी दुःखें आणि संकटें भोगली त्याचा शतांशहि दुसऱ्या कोणाच्या वाट्याला आलेला नाही. तथापि प्राचीनकाळी अस्तित्वात असलेलें हिंदुकुल आजहि जशाचे तसेंच अस्तित्वात आहे. संकटांस तोंड देण्याची त्याची जितकी तयारी पूर्वी होती, तितकीच ती आजहि आहे; इतकेंच नव्हे तर तें कुल या संकटांनी अधिक बलवान् होत आहे अशीहि चिन्हें आज दिसत आहेत. जग जिंकण्याकरितां पुनः बाहेर पडण्याच्या तयारीत आम्ही आहोत, हीच गोष्ट आमच्या जिवंतपणाची द्योतक आहे.<br>{{gap}}आज आपले विचार केवळ हिंदुस्थानाच्या चार भिंतींच्या आंतच वावरत नाहीत, हे आज आपणांस उघड दिसत आहे. आपल्या कल्पनांनी या भिंतींचें उड्डाण केले आहे हे आपणांस ठाऊक आहे. आपली मातृभूमि सोडून या कल्पना जगातील साऱ्या देशांत वावरू लागल्या आहेत आणि त्यांचा प्रवेश त्या वाङ्मयांत होत आहे. आपली इच्छा असो वा नसो, आपल्या कल्पना आपणांस आतां चिकटून बसत नाहीत, हे निश्चित आहे. या कल्पना विदेशीय वाङ्मयांत शिरत आहेत; एवढेच नव्हे तर तेथे त्यांचे अधिराज्य स्थापन होईल अशीहि चिन्हें दिसत आहेत. असें कां व्हावें? याचे कारण हेच की, जगाच्या उत्क्रांतीचें जें समीकृत कार्य चालू आहे, त्यांत भरतभूमीनेच मोठा वाटा उचलला आहे. मनुष्याच्या मनांत उत्पन्न होणाऱ्या विचारतरंगांतील सर्वांत श्रेष्ठ आणि सर्वांत उदात्त तरंगांची उत्पत्ति भरतभूमीत होते. भरतभूमीच्या तत्त्वज्ञानाने जें श्रेष्ठ स्थान पूर्वी मिळविलें, तें त्याजकडे आजहि चालू आहे. मनुष्य जातीची वाढ किती मार्गांनी करितां येईल, याचा शोध आमच्या पूर्वजांनींहि अनेक प्रकारे केला होता. अर्वाचीन पाश्चात्य राष्ट्र ज्याप्रमाणे बाह्य सृष्टीत अनेक मार्ग आज धुंडाळीत आहेत, त्याचप्रमाणे आमचे प्राचीन पूर्वजहि बाह्य सृष्टीचा कोनाकोंपरा धुंडाळीत होते. बाह्य सृष्टीचीं रहस्ये त्यांनी पुष्कळ शोधून काढलीं, आणि त्यांची बुद्धि विशाल असल्यामुळे सांप्रतच्या जगाच्या स्वप्नांतहि न आलेले असे चमत्कार त्यांनी करून दाखविले; पण त्यांच्या बुद्धीचे वळणच निराळे पडले. यामुळे बाह्य जग लवकरच सोडून उच्चतर हेतूच्या सिद्धीकडे ती वळली. जें जाणलें असतां जाणावयाचे असें<noinclude><br>{{gap}}स्वा० वि० खं०-९-१७.</noinclude> eug2pmlhq88e9jw5awiooy61fmf644i पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६३ 104 66828 233298 156090 2026-07-19T08:27:14Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233298 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२५८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>काही उरत नाही, अशा ज्ञानाच्या मागे ती लागली. बाह्य सृष्टि अनंत चमत्कांरांनी भरली आहे ही गोष्ट खोटी नाही. हीच सृष्टि महत्त्वाची आहे हेहि खरे, पण ती अस्थिर आहे, ती क्षणभंगुर आहे. आता जिवंत असलेली वस्तु क्षणार्धाने मृत्युमुखीं जाते; आतां सुखी म्हणून दिसत असलेला मनुष्य क्षणार्धानंतर दुःखांत चूर होऊन गेलेला आढळतो. अशा स्थितीत बाह्य सृष्टीचे महत्त्वही भासेनासें होते. तिच्या चमत्कारांतील चमत्कृति नाहींशी होते. ही गोष्ट आमच्या प्राचीन आर्यांच्या लक्षांत लवकरच आल्यामुळे अविकार्य आणि सदानंदरूप जें कांही आहे. त्याचे आकलन ज्या शास्त्राच्या अध्ययनाने होईल त्या शास्त्राच्या शोधाकडे त्यांची बुद्धि वळली. ज्या एकाच ठिकाणी चिर शांतीचा लाभ होतो, ज्या एकाच ठिकाणी चिरजीवन मिळतें, ज्या एकाच ठिकाणी पूर्णत्वाचा प्रत्यय येतो आणि ज्या एकाच ठिकाणी सर्व दुःखांची समाप्ति होते, त्या ठिकाणाचा शोध ज्या शास्त्राने लागेल तें शास्त्र सर्वांत श्रेष्ठतम होय हे उघड आहे; आणि याच शास्त्राच्या शोधाकडे आमच्या पूर्वजांची बुद्धि वळली. त्यांची इच्छा असती तर भौतिक शास्त्रेहि त्यांना करतलामलकवत् करता आली नसती असे नाही. जी शास्त्रे सिद्ध झाली असता पोटाला तुकडा मिळतो, शरिराला आच्छादन प्राप्त होते आणि फार तर आपल्या इतर बांधवांवर प्रभुत्व गाजविता येते, असली शास्त्रे त्यांनी सहज शोधून काढली असती. ज्या शास्त्रांच्या शोधाने आपल्या इतर बांधवांस जिंकून त्यांना आपले गुलाम करितां येते आणि ज्या शास्त्रांच्या शोधाने 'बळी तोच कानपिळी' होतो, ती शास्त्रे त्यांच्या विशाल बुद्धीला अगम्य नव्हती. पण परमेश्वराची मोठी कृपा ती हीच की, ही ऐहिक सृष्टि सोडून त्यांची बुद्धि लवकरच उलट बाजूला वळली. बाह्य सृष्टीहून अधिक श्रेष्ठ अशा अंतःसृष्टीचा अभ्यास आमच्या पूर्वजांनी केला. या सृष्टीत त्यांचे चित्त इतकें रममाण होऊन गेले की, बाह्य जगाकडचे त्यांचे लक्ष अगदीच सुटले; आणि आनुवंशिक संस्कारांनी ही निवृत्ति त्यांच्या वंशजांतहि उतरूं लागली. अखेरीस निवृत्ति-मार्गप्रियता ही साऱ्या राष्ट्राची निशाणी होऊन बसली. बुद्धीचे हे वळण थेट आमच्यापर्यंतही आज येऊन पोचलें आहे. हजारों वर्षे हेच संस्कार पिढ्यानपिढ्या हिंदुवंशांत उतरत आलेले आहेत. आणि आज तेच आमच्या जीविताशी एकरूप होऊन बसले आहेत. आमच्या नाड्यांतील रक्तच्या प्रत्येक थेंबांत त्यांचा संचार आहे. ते आमच्याशी<noinclude></noinclude> 35o73b405egix7vl0h6iyvntrj0bjo1 पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६४ 104 66829 233299 156233 2026-07-19T08:30:35Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233299 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२५९ }} {{rule}}</noinclude>एकजीव होऊन गेल्यामुळे अंतःसृष्टीची आवड ही आह्मांस उपजतबुद्धी सारखी होऊन बसली आहे. हिंदु ह्मणजे धर्मज्ञानप्रियतेची मूर्ति असा आमच्या कुलाच्या नावाचा अर्थ रूढ झाला आहे असें म्हाणण्यास प्रत्यवाय नाही. हे वळण साऱ्या राष्ट्रालाच लागले आहे आणि आता त्यांतून त्याला परावृत्त करणे शक्य नाही. तरवार आणि अग्निशिखा हाती घेऊन लक्षावधि रानटी लोक येथे आले. स्वतःबरोबर आपला रानटी धर्महि त्यांनी येथे आणिला; पण आमच्या हृदयाला या वस्तूंचा स्पर्श होऊ शकला नाही. आमच्या मस्तकांतील मणि अबाधित राहिला; आमच्या हृदयांतील रहस्य कोणालाहि बाहेर काढता आले नाही. हिंदुकुलाचा जीवन हेतु हाच, आणि या हेतूचे जोपर्यंत उच्चाटन झाले नाही, तोपर्यंत हिंदुकुल नष्ट करण्याचे सामर्थ्य या विश्वांत कोणाच्याहि अंगी नाही हे तुम्ही निश्चित समजा. त्याला नष्ट करील अशी एकहि शक्ति अद्यापि जन्मास आलेली नाही. जगांतील सारा छळ आणि सारी दुःखें यांच्या लाटांमागून लाटा आम्हांवरून गेल्या तरी आमच्या जीविताला यत्किंचितहि धक्का लागावयाचा नाही. प्रचंड ज्वालांतून प्रल्हादाप्रमाणेच आम्ही सुखरूप बाहेर पडूं. पण हे होण्यास आमचा हेतु मात्र आम्ही कधीहि आमच्या दृष्टिआड होऊ देतां उपयोगी नाही. जगांतील साऱ्या अनर्थातून आम्हांस वांचविण्याचे सामर्थ्य फक्त त्याच्याच अंगी आहे ही गोष्ट आपण नित्य लक्षांत बाळगिली पाहिजे. धर्मज्ञानाची आवड ज्या हिंदूला नाही तो हिंदूच नव्हे असें मी समजतो.<br>{{gap}}इतर देशांत राजकारण आधी आणि धर्म मग. प्रत्येकाला राजव्यवहार अगोदर समजला पाहिजे आणि मग धर्माचे थोडें बहुत ज्ञान असल्यास चालेल. आमची गोष्ट ह्याच्या अगदी उलट आहे. धर्म प्रथम आणि बाकीच्या गोष्टी त्यानंतर; हा आमचा क्रम अनादि काळापासून ठरून गेला आहे. धमीचें ज्ञान आधी होऊन मग वेळ उरल्यास इतर गोष्टी करण्याची परवानगी आम्हांस आहे. हा मुख्य मुद्दा आपण एकवार ध्यानात ठेवला म्हणजे आमच्या हिंदु वंशाची सारी कर्तृत्वशक्ति कोणत्या मुद्यावर एकवटतां येईल, हे आपल्या लक्षात येईल, प्राचीन काळीहि याच बाबीकरितां हिंदुकुल अनेक वार एकवटले होते आणि आजहि आमच्या राष्ट्रीय कल्याणाचा एकच मार्ग आहे. एकीभूत हिंदुस्थान म्हणजे तत्त्वज्ञानाचे समीकरण असा अर्थ होतो. धर्मासाठी<noinclude></noinclude> 23a0r6bshdqbpbjgzxsopm9uibnoqfs पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६५ 104 66830 233300 156234 2026-07-19T08:49:05Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233300 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६० |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>झगडण्यास तयार असलेली अंतःकरणे एकत्र होणे हेच हिंदुस्थानाचें एक राष्ट्रीयत्व आहे. <br>{{gap}}हिंदुस्थानात अनेक पंथ अगोदरच अस्तित्वात आहेत. आमच्या साऱ्यांच्या धार्मिक गरजा भागविण्यास पुरून उरण्याइतके ते आज आहेत आणि भविष्यत्कालींहि आणखी कित्येक निर्माण होतील. येथे अनेक पंथांस अवकाश मिळावा अशाच प्रकारची आमच्या मूलभूत तत्त्वांची रचना आहे. आमची परोक्ष तत्त्वे कसलाहि व्यावहारिक निर्बंध उत्पन्न करीत नाहीत. मूलभूत तत्वांचे अत्यंत विस्तृत विशदीकरण अनेक प्रसंगी आणि अनेक प्रकारे आजपर्यंत झाले असतांहि त्यांत आकुंचितपणाचा प्रवेश झाला नाही. कोणत्याही लहान मोठ्या वस्तूला आकाश ज्याप्रमाणे आपल्या पोटांत थारा देते, त्याप्रमाणे आमच्या धर्मतत्त्वांतहि हव्या त्या पंथाला स्थल मिळतें. आमच्या तत्त्वांचा विस्तार खुद्द प्रकृतीच्या विस्ताराप्रमाणे अनंत आणि सर्वव्यापी आहे. अशा स्थितींत अनेक पंथ तेथें सुखाने एकत्र नांदतात यांत नवल नाही. भांडण पंथांचे नसून पंथवाल्यांचे असते आणि ही युद्धे मात्र बंद करणे अवश्य आहे. पंथ हवे तितके असले तरी चिंता नाही, पण हठवादी पंथवाले मात्र नकोत. अशा हठवादी पंथवाल्यांच्या अस्तित्वाने जगाचा कांही फायदा होतो असें नाहीं; पण अनेक पंथ अस्तित्वात नसतील तर मात्र जगाचे गाडें ताबडतोब थांबेल. प्रत्येकाला सर्वच गोष्टी करितां येतात असे नाही. जगांतील समवायी कार्यशक्ति इतकी प्रचंड आहे की, तिचे नियमन मूठभर लोकांना करितां येणे कधीहि शक्य नाही. याकरितां श्रमविभाग अवश्य पाहिजेच. अत्यंत आवश्यकतेमुळेच श्रमविभागाचे तत्त्व जन्मास आले आहे आणि याच तत्त्वावर अनेक धर्मपंथहि अस्तित्वात आले आहेत. सूक्ष्म शक्तीचे यथायोग्य नियमन होण्याकरितां अनेक पंथ अस्तित्वात असणे अवश्य आहे. तथापि असे असतांहि या पंथांत तंटे भांडणे असावी हे अवश्य नाही. या दृश्य विविधतेमागें ऐक्य आहे ही गोष्ट आमची शास्त्रें फार प्राचीन काळापासून उच्च घोषाने सांगत आली आहेत आणि हाच न्याय या अनेक पंथांसहि लागू आहे. अनेक मण्यांच्या पोटी ज्याप्रमाणे एकच सूत्र असते, त्या प्रमाणे या अनेक पंथांच्या पोटी एकच तत्त्व आहे. 'एकं सत् विप्रा बहुधा वदंति।' हा सिद्धांत आपण सर्वांनी नीट ध्यानात ठेवला पाहिजे. हे अनेक<noinclude></noinclude> 4fazkkfnqdelu6mf5fbw43awqvg9ycb पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६६ 104 66831 233301 156235 2026-07-19T08:54:48Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233301 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२६ }} {{rule}}</noinclude>पंथ म्हणजे एकाच वस्तूची अनेक नांवें होत. याकरितां, या पंथवाल्यांनी आपसांत तंटे करणे, युद्धे करणे, परस्परांचा द्वेष आणि मत्सर करणे अथवा परस्परांस व्यर्थ हिणवू पहाणे ही खरोखरच मोठ्या शरमेची गोष्ट आहे. ज्या भूमीत साऱ्या धर्मांना आणि धर्मपंथांना सारखाच मान आजपर्यंत मिळत आला आहे, आणि सहिष्णुतेचे बाळकडू ज्या देशांतील पुण्य पुरुषांनी आपल्या वंशजांस पाजलें, त्या देशांतील सध्याच्या पिढीने असहिष्णुतेचा अंगीकार करावा हे अगदी अयोग्य आहे. सहिष्णुता ज्यांच्या रोमरोमांत खेळत होती, त्यांचे वंशज म्हणविण्यास आम्हांस खरोखर लाज वाटली पाहिजे.<br>{{gap}}वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य, वेदांती इत्यादि अनेक मते आपणांत प्रचलित असली अथवा ही सारी टाकून देऊन कोणी अर्वाचीन पद्धतीचा भक्त बनला असला, तरी आपणां सर्वांना सामान्य अशी काही तत्त्वे आपल्या धर्मात आहेत. अर्वाचीन सुधारलेल्या धर्माचा अंगीकार कोणी केला अथवा जुन्या कर्मठ पंथाचा कोणी असला, तरी या दोहींचीहि एकवाक्यता जेथें होते अशी काही तत्त्वे आहेत. या सामान्य तत्त्वांचे स्पष्टीकरण देगवेगळ्या पद्धतीने कोणी केले असले, तरी मूल तत्त्वांच्या मान्यतेबद्दल वाद नाही. अशा प्रकारचे ध्येय असणारच आणि ते तसे असावें हे इष्टहि आहे. सर्वांनी एकाच मार्गाने गेले पाहिजे हा आपला मूल हेतु नाही. आपलेंच म्हणणे सर्वांनी मान्य केले पाहिजे असा हट्ट धरणे हे पातक आहे. अखेरचा मुक्काम एकच असल्यावर रस्ते वेगवेगळे असणे हे रास्त आणि इष्टही आहे. आपल्या मार्गाने जाण्यास आपणांस जशी मुभा आहे, त्याचप्रमाणे ती इतरांसही असली पाहिजे. श्रुतींस मान्यता हे आपल्या धर्माचे सर्वमान्य तत्त्व आहे. सनातन धर्माचे रहस्य श्रुतीत आहे, या सिद्धांताबद्दल कोणीहि हिंदू वाद घालणार नाही, असे मला वाटते. त्याचप्रमाणे श्रुति अनाद्यनंत आहेत असे सर्व हिंदूंचे मत आहे. प्रकृतीला ज्याप्रमाणे आदि अथवा अंत नाही, त्याचप्रमाणे श्रुतींनाहि आदि अंत नाही. आपणांत कितीहि मतभेद झाले आणि त्याबद्दल कितीहि रणे माजली तरी या साऱ्या तंट्यांचा अखेरचा निकाल लागण्याची जागा श्रुति हीच. श्रुतींत कमी अथवा अधिक महत्त्वाचा भाग कोणता, या बद्दलहि आपणांत मतभेद असू शकेल. एखादा भाग एखाद्या पंथाला सार सर्वस्वरूप वाटला तर तोच भाग दुसऱ्याला कदाचित् कमी महत्वाचा वाटेल;<noinclude></noinclude> lix5ck4yoc2ujfkea4bvwb5m7d7o67m पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६७ 104 66832 233302 156236 2026-07-19T08:57:12Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233302 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६२ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>तथापि अशा स्थितीतहि श्रुतिप्रामाण्याला आपल्या दृष्टीने बाध येत नाही. श्रुति हे परमपूज्य ग्रंथ आहेत आणि मानवी जीविताच्या रहस्याचे कोडे त्यांनी उलगडले आहे, याबद्दल आपणांत मतभेद नाही. असें आहे तर प्रत्यक्ष व्यवहारांत दिसून येणारे पंथांचे भेद विसरून जाणे आपणांस अशक्य नाही. या तत्त्वाचाच प्रसार होईल तितक्या झपाट्याने मोठ्या प्रमाणावर आपण केला पाहिजे.<br>{{gap}}ईश्वराच्या अस्तित्वाबद्दलही आपणांत वाद नाहीं हा दुसरा मुद्दा आहे. आपण सारे आस्तिक्यवादी आहों. परमेश्वर सृष्टीचा उत्पन्न कर्ता आणि पालनकर्ता असून कल्पांताच्या वेळीही सृष्टि त्याच्याच स्वरूपांत समाविष्ट होते, हे मतहि आपणां सर्वांस सारखेंच मान्य आहे. यथाकाळी हीच सूक्ष्म रूप सृष्टि पुनः स्थूलरूप धारण करून नानाविध वस्तूंच्या रूपाने प्रकट होते. ईश्वराच्या स्वरूपाबद्दल आपणांत वाद असू शकेल; कोणाला त्याचे शुद्ध व्यक्त रूपच मान्य असेल तर दुसऱ्या कोणाला तो निराकाररूपाने मान्य असेल आणि या दोघांनाही श्रुतींत आधार सांपडतील. तथापि असे असतांहि परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल आपणांत वाद नाही. परमेश्वर म्हणजे अनंत शक्ति आणि त्या शक्तींतूनच हे सारे विश्व प्रकट झाले असून तिच्यांतच तें रहातें व अखेरीस त्याच शक्तीला ते परत जाते, या मूलतत्त्वाबद्दल आपणां हिंदूंत मतभेद नाही. किंबहुना हे मूलतत्त्व ज्याला मान्य नाही त्याला हिंदूहि ह्मणतां येणार नाही. हे तत्त्व आपणां सर्वास सारखेंच मान्य आहे. त्याचाच प्रसार साऱ्या देशांत आपण करूया. तुह्मांस साधेल त्या मार्गाने हे तत्त्व सर्व लोकांस पटेल असें करा. आपणां सर्वांचे मार्ग भिन्न झाले तरी त्यांत अमुक खरा व अमुक खोटा अशी निवड करिता येत नाही हे लक्षात ठेविले पाहिजे. एखादा मार्ग दुसऱ्याहून कदाचित् अधिक चांगला असेल; तथापि सर्वथैव खोटा असा एकहि मार्ग नाही. एक कनिष्ठ, एक मध्यम, एक चांगला अथवा एक सर्वोत्कृष्ट असा भेद असू शकेल; तथापि खोटा हे विशेषण कोणासहि लावितां येणार नाही. धर्ममार्गाच्या बाबतींत खोटा या शब्दाला स्थानच नाही. याकरिता ईश्वराचा मार्ग दाखविण्यास जे कोणी उद्युक्त असतील, त्या साऱ्यांनाच परमेश्वराचा आशीर्वाद आहे. कोणत्याही मार्गाने का होईना त्याची ओळख सामान्य जनांस अधिकाधिक पटवून देण्याचे कार्य तुम्ही केले, तर त्यांत साऱ्या हिंदु कुलाचेच<noinclude></noinclude> q1n531wlm7w57wf3l91j4um01j5pbtw पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६८ 104 66833 233303 156243 2026-07-19T09:01:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233303 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२६३ }} {{rule}}</noinclude>कल्याण आहे. गरिबाच्या झोपडीपासून राजवाड्यापर्यंत आणि बालापासून वृद्धापर्यंत सर्वांना धर्ममार्गावर आरूढ करणे, हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. हे जग अमुक एक हजार वर्षांपूर्वी परमेश्वराने निर्माण केले आणि एखादे दिवशी तो त्याचा अखेरचा शेवट करून टाकील हे काही इतर धर्मीयांचें मत आपणां हिंदूंस मान्य नाही, हा आपला तिसरा विशेष होय. त्याचप्रमाणे परमेश्वराने चराचर सृष्टि निर्माण केली आणि तिच्या मागोमागच मनुष्यप्राणीहि त्याने निर्माण केला हेहि ह्मणणे आपणांस मान्य नाही. परमेश्वराने ही सृष्टि केवळ अभावांतून निर्माण केली हे मतहि आम्ही त्याज्य समजतो. या मुद्यासंबंधी आपणांतील सर्व मतांची आणि पंथांची एकवाक्यता आहे, असा माझा समज आहे. सृष्टि अनाद्यनंत असून कल्पांताच्या वेळी तिचे हे जड अथवा दृश्यरूप नष्ट होऊन सूक्ष्म रूपाला ती परत जाते; काही काळ त्या अव्यक्तरूपांत स्थिर रहाते; आणि पुनः योग्य काळी व्यक्तरूपाला येऊन आपण पहात असलेली सारी सृष्टि दिसू लागते असे आमचे मत आहे. ही चक्राकार गति कालाच्या आरंभाच्याहि आदीपासून चालू आहे; आणि ती अशीच चालू रहाणार आहे. भविष्यकाली अमुक एका प्रसंगी या सृष्टीचा अखेरचा अंक होईल हे म्हणणे आह्मांस मान्य नाही.<br>{{gap}}त्याचप्रमाणे मनुष्याचा देह दिसतो अथवा त्याच्या अंतरिंद्रियांचा प्रत्यय येतो तेवढ्यांतच मनुष्यप्राणी साठविलेला असतो असें नसून, त्याचे स्वरूप त्याहून अधिक विशाल आहे असेंहि आम्हां हिंदूंचे मत आहे. देह अस्थिर आहे, त्यांत प्रत्येक क्षणी बदल होत आहे; त्याच प्रमाणे मनोघटनाहि अस्थिर आहे; पण या दोन अस्थिर स्वरूपांपलीकडे चिरस्थायी स्वरूपाचें आत्मरूप आहे. आत्मा या शब्दाला योग्य प्रतिशब्द इंग्रजी भाषेत नाही. त्याला कोणताहि प्रतिशब्द तुम्ही योजला तरी तो चुकीचा होईल. आत्म्याला आदि नाही आणि अंतहि नाही. मृत्यु हा शब्द त्याच्या गांवीं नाही. हे आमचे मत इतर धर्मीयांस ठाऊक नाही. या बाबींत इतरांपासून आम्ही अगदी विभक्त आहो. हा चिरस्थायी आत्मा वारंवार वेगवेगळ्या देहांचा आश्रय करित असतो, आणि त्याचा कार्यभाग संपला म्हणजे तो कायमचा मुक्तरूपांत रहातो, हे आमचे मतहि इतरांहून विशेष आहे. आमच्या सर्व शास्त्रांनी या मताचे प्रतिपादन केले असून आम्हां साऱ्या हिंदूंस तें सारखेंच<noinclude></noinclude> 2efv291devpyd386sxokvt2lqm87kkm पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२६९ 104 66834 233304 156249 2026-07-19T09:04:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233304 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६४ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>मान्य आहे. कोणतेंहि मत अथवा पंथ याविरुद्ध बोलत नाही. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल मतवैचित्र्य असले तरी आत्मा नित्य आहे या मुद्याबद्दल वाद नाही. कित्येकांच्या मताप्रमाणे आत्मा आणि परमात्मा हे द्वैत कायमचे आहे, असे एखादा पंथ म्हणतो आणि तें तसें नाहीं असें दुसरा कोणी म्हणतो. आणखी कोणाच्या मते आत्मा परमात्म्याचाच अंश असतो. अशा प्रकारचे कितीहि मतवैचित्र्य असले, तथापि आत्मा स्थिर रूप आहे या मूलभूत सिद्धांताबद्दल आपणांत वाद नाही. आत्म्याला कोणी निर्माण केलें नाहीं, तो अनंत आहे, तो अमर आहे आणि निरनिराळ्या काळी निरनिराळ्या देहांचा आश्रय करून अखेरीस तो स्थिररूप कायमचा रहातो, याबद्दल आपणांत मतभेद नाही.<br>{{gap}}आतां यापुढे आमच्या पूर्वजांनी धर्मज्ञानाच्या बाबींत जो शोध लावला तो खरोखरच अत्यंत आश्चर्यजनक आणि अत्यंत उज्ज्वल रूपाचा आहे. या शोधाने धर्मज्ञानाची अखेर झाली असेंहि म्हटले तरी चालेल. पौर्वात्य तत्त्वज्ञान आणि पाश्चात्य विचारसरणी यांत जो मोठा भेद आहे, तो तुमच्या लक्षात आलाच असेल. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा अभ्यास ज्यांनी केला असेल त्यांना हा भेद मूलतःच आहे हे स्पष्ट कळून चुकले असेल. तो भेद असा:- आत्मा हा स्वभावतःच पवित्र, पूर्ण, अनंत आणि सच्चिदानंदरूप आहे असें पौरस्त्य तत्त्वज्ञांचे मत आहे. शाक्त, शैव, सौर, वैष्णव इत्यादि अनेक भेद आमच्यांत असले, तरी या मूल सिद्धांताबद्दल त्यांत मतभेद नाही. त्याच प्रमाणे बौद्ध, जैन वगैरे दुसरे पौरस्त्य धर्महि याच मताचा अनुवाद करितात. द्वैत आणि अद्वैत या मतांतील भेदहि या बाबतीत फार थोडा आहे. पूर्व दुष्कर्मानुसार पवित्र आत्मा अपवित्र झाला आहे आणि परमेश्वराच्या कृपेनें तो पुनः पवित्र होईल असें द्वैतवादी म्हणतात. उलट पक्षी आत्मा अपवित्र झाला आहे ही गोष्टही खोटी असून ती आभासरूप आहे असे अद्वैती म्हणतात. मायेचें आवरण आपणांवर असल्यामुळे आत्मा विकृत झाल्याचा भास आपणांस होतो. वस्तुतः त्याचे सच्चिदानंदरूप बाधित झाले नसतांहि तें तसें झाले आहेसे भासणे हीच माया. दोन मतांतील हा फरक अशा प्रकारचा आहे; तथापि मूल मुद्द्यासंबंधी दोहोंची एकवाक्यता आहे. पाश्चात्य विचार सरणीची गोष्ट याहून भिन्न आहे. त्यांच्या विचारसरणींत आणि आमच्या तत्त्व-<noinclude></noinclude> ipws4tjcfayv82kbg1581qmsmvlxa0j पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७० 104 66835 233305 156250 2026-07-19T09:07:28Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233305 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२६५}} {{rule}}</noinclude>ज्ञानांत येथे मूलतःच भेद आहे. आत्मा स्वभावतः पवित्र आहे हा आमचा सिद्धांत असल्यामुळे आमची दृष्टि अर्थातच अंतर्वर्ती होते. जगांतील पावित्र्याचा शोध आम्ही अंतःसृष्टीत शिरून करू लागलो. आम्ही पूजेला बसलों ह्मणजे आपले डोळे मिटतो. अंतर्मुख होऊन परमेश्वर शोधावा ही आमची नैसर्गिक प्रवृत्ति आहे. बाह्य सृष्टीपासून परावृत्त होऊन अंतर्मुखतेनें ध्यान केल्यास परमेश्वर आंतच कोठेतरी सांपडेल असें आह्मांस वाटते. उलटपक्षी पाश्चात्य भक्त परमेश्वराचा शोध करूं लागला ह्मणजे तो आकाशाकडे डोळे करतो. परमेश्वराने आपलें ज्ञान कोणाला तरी प्रकट होऊन सांगितले आणि त्यांतून आपली धर्मपुस्तकें निर्माण झाली असा पाश्चात्यांचा समज आहे. उलटपक्षी आमचे धर्मग्रंथ आमच्या मंत्रदृष्टयांच्या खोल हृदयांतून निर्माण झाले असे आम्ही समजतो.<br>{{gap}}आतां सांगितलेला हा मुद्दा आपण विशेषेकरून ध्यानात ठेविला पाहिजे; एवढेच नव्हे, तर तो सर्वांच्या हृदयावर पक्का ठसविण्याचा अट्टाहास केला पाहिजे. मी स्वभावतःच परिपूर्ण निरामय आणि आनंदरूप आहे असे प्रत्येकाला वाटावयास लावणे, हीच आपली भविष्यकालाची कामगिरी होय. प्रियबंधूंनो! मी दुबळा, मी पापी असें ज्याला वाटते, त्या मनुष्यापासून कवडीचाहि लाभ त्याला अथवा जगाला होणार नाही, हे तुम्ही निश्चित समजा. या सिद्धांताबद्दल माझी बालंबाल खात्री झाली आहे आणि म्हणूनच त्याचें पुनःपुन्हां चर्वितचर्वण इतक्या तांतडीने मी तुम्हांपुढे करितो. हा सिद्धांत तुम्ही पक्का ध्यानांत धरा, त्याला अनुसरून आपली वागणूक ठेवा आणि दुसऱ्याच्या हृदयावरहि तो ठसविण्याची खटपट करा. मी पापी, मो दुःखी, मला काहीच किंमत नाही, असले विचार ज्याच्या चित्तांत रात्रंदिवस घोळतात, त्याचे जीवित अखेरीस खरोखरच अर्थशून्य होऊन बसतें. मी सर्व शक्तिमान् आहे, असें चिंतन तुम्ही अहोरात्र कराल तर तुम्ही निःसंशय तसेच व्हाल; आणि याच्या उलट चिंतन तुम्ही केले तर तुम्ही अखेरीस शून्यप्राय व्हाल हेहि निश्चित आहे. हा महासिद्धांत कधीहि विसरू नका. तुमचे सारे जीवित या एकाच मुद्यावर अवलंबून आहे. आम्ही सर्वशक्तिमंताचे वारसदार आहों, आमच्या ठिकाणी अनंत अग्नीचा स्फुल्लिंग आहे आणि आम्ही यथाकाली स्वतः अनंतरूप होऊं, हेच ध्यान तुमच्या चित्ताला सदो-<noinclude></noinclude> lmhlehjku76vf4nirlc5w6ldv7qhthf पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७१ 104 66836 233306 156251 2026-07-19T09:09:47Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233306 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६६ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>दित असू द्या. मी कः पदार्थ आहे हा विचार तुमच्या चित्ताला शिवतो तरी कसा? सर्व तुम्हीच आहां; जगांतील सारी सत्ता आणि सामर्थ्य तुमच्या अंगी आहे. याकरितां मी वाटेल ते करूं शकेन आणि वाटेल तें करण्याची माझी तयारी आहे असे चिंतन करीत चला. वाटेल तें करण्याची तयारी प्रत्येकानेंच केली पाहिजे, अशी दृढ आत्मश्रद्धा आपल्या पूर्वजांच्या अंगी होती. या आत्मश्रद्धेनेच नवीं नवीं कार्ये अंगिकारण्यास त्यांना उद्युक्त केले. या आत्मश्रद्धेमुळेच त्यांचा अधिकाधिक विश्वास होत गेला. हिंदु राष्ट्र एका काळी संस्कृतीच्या अत्युच्च शिखरावर जाऊन पोचलें, याचे कारण आपल्या पूर्व जांची ही आत्मश्रद्धाच होय; आणि आतां तुह्मांस अवनती झाल्याचे दिसत असेल आणि तुमच्यांत कांहीं उणेपणा आल्याचा प्रत्यय तुम्हांस येत असेल, तर त्याचे कारण हा आत्मविश्वास तुमच्यांतून नष्ट झाला. ज्या दिवशी आत्मविश्वास नाहीसा झाला, त्याच दिवशी तुमच्या अवनतीचा पाया पडला हे माझे शब्द पक्के ध्यानांत धरा. आत्मविश्वासाचा अभाव हाच खरा नास्तिकपणा होय. ज्याचा विश्वास स्वतःच्या कर्तबगारीवर नाही आणि ज्याला स्वतःचाच भरंवसा वाटत नाही, त्याला परमेश्वराचा भरंवसा तरी कोठून वाटणार? आपल्या हस्तादि इंद्रियांच्या द्वारें अनंत परमेश्वरच काय करीत आहे, असा भरंवसा तुमच्या चित्तांत उत्पन्न झाला आहे काय? हा अंतर्यामी, हा सर्वगामी परमात्मा प्रत्येक अणुरेणूंत ओतप्रोत भरून राहिला आहे आणि तोच माझ्या देहांत, मनांत, बुद्धीत आणि जीवात्म्यांत ओतप्रोत भरला आहे, असा विश्वास तुमच्या चित्तांत खरोखरच असेल तर निराशेचा पगडा तुमच्या चित्तावर कां बसावा? मी अगदी क्षुद्र प्राणी असेन, महासागरावरील एखादा लहानसा तरंग मी असेन आणि तुम्ही प्रचंड लाट असाल; पण असे असले म्हणून काय झाले? जो महासागर तुमच्या पाठीशी उभा आहे, तोच माझ्या पाठीशी हि नाही काय? जे सर्वशक्तिमत्त्व तुमच्या ठिकाणी अधिक विस्तृत स्वरूपांत प्रकट झाले आहे, तेच माझ्या ठिकाणी बीजरूपाने तरी नाही काय? तुम्ही पर्वतासारखे विशाल असाल, तथापि ज्याच्या बळावर तुम्ही पर्वतप्राय बनला आहां, त्याच बळाशी माझाहि योग जन्मापासून झाला आहे. माझ्या ठिकाणी अस्तित्व आलें हीच त्या योगाची खूण आहे. जें सच्चिदानंद रूप तुमच्या पर्वतप्राय आकाराच्या मागे आहे,<noinclude></noinclude> f7ulqcu5b8dla14yiaiawhsmo73nfhy पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७२ 104 66837 233307 156252 2026-07-19T09:12:40Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233307 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२६७}} {{rule}}</noinclude>तेच माझ्या या बिंदुरूपाच्याहि मागे आहे. प्रियबंधूंनो! या महा मंत्राचे पठन अहोरात्र तुम्ही करा. याच्या जपाशिवाय एक क्षणहि जाऊ देऊ नका; आणि तुमची मुलेबाळे जन्माला आली म्हणजे तेव्हापासूनच या महामंत्राचा उपदेश त्यांना तुम्ही करा. त्यांना अद्वैत-दैत अथवा हा पंथ आणि तो पंथ असल्या शुष्क भानगडीत पाडण्याचें तुम्हांस कांहीं कारण नाही. तुम्ही कोणत्याहि पंथाचे असा आणि त्यांनाहि वाटेल त्या पंथाचा अंगीकार करू द्या; पण हा अत्यंत उदात्त आणि अत्यंत उज्वल असा सर्व सामान्य पंथ मात्र तुम्ही विसरू नका; आणि तुमच्या मुलांबाळांसहि विसरू देऊ नका. जीवात्मा स्वभावतः परिपूर्ण आहे हे मत हिंदुस्थानांतील साऱ्या पंथांना सारखेच मान्य आहे. जें मूलतःच परिपूर्ण नाहीं तें कशानेंहि पूर्णत्व पावणार नाहीं; आणि बाह्य वस्तूंच्या उपाधीने पूर्णत्व त्याला चिकटविले, तरी ते केव्हांना केव्हां नष्ट होईल असें श्रीकपिलांनी म्हटले आहे. अपवित्रता हा मनुष्याचा स्वभाव असेल तर त्याने सदोदित अपवित्रच राहिले पाहिजे. दहापांच पळे पावित्र्याची छाया त्याच्यावर पडली तरी पुनः तो पहिल्यासारखाच अपवित्र राहणार. पावित्र्याचे हे कवच आज ना उद्यां गळून जाऊन त्याचा मूळचा स्वभाव पुनः केव्हां तरी प्रकट होणार. वाघ्याचा पाग्या झाला तरी त्याचा मूळस्वभाव केव्हां तरी प्रकट होऊन त्याच्याकडून 'एळकोट' म्हणविल्यावांचून राहणार नाही. याकरिता आपले स्वाभाविक स्वरूप सच्चिदानंद हेच आहे असे आपले तत्वज्ञ सांगतात. मृत्युसमयी आपल्या महत्कृत्यांचे आणि उदात्त विचारांचे स्मरण ठेव असा उपदेश एका ऋषीने आपल्या मनाला केला, तो आपण सर्वांनी ध्यानात धरण्यासारखा आहे. आपलें दौर्बल्य आणि दुबळे विचार अथवा आपलें मूर्खत्व यांपैकी कशाचाहि स्पर्श आपल्या चित्ताला अखेरीस असूं नये अशी खबरदारी घेण्याबद्दल या ऋषिवर्याचा उपदेश आहे. मूर्खपणाची कृत्ये सर्वांच्याच हातून घडतात. दुबळेपणाचे विचार केव्हांना केव्हा आपल्या साऱ्यांच्या चित्तांत येत असतात; तथापि त्यांतूनहि आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडू न देणे, हाच दौर्बल्यनाशाचा उपाय आहे. आपल्या साऱ्या मूर्खपणाला हेच उत्तम औषध आहे.<br>{{gap}}हिंदुस्थानांतील निरनिराळ्या धर्मात आणि पंथांत सर्वांस मान्य असलेल्या काही मुद्यांचा विचार येथवर झाला; आणि याच सामान्य पायावर जुना,<noinclude></noinclude> bpnbp949nytuesnoa1s27udqqyfv2jx पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७३ 104 66838 233308 156806 2026-07-19T09:15:22Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233308 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६८ |स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.|[ नवम}} {{rule}}</noinclude>नवा, कर्मठ, उदारमतवादी इत्यादि अनेक पंथांना आपली पुढील इमारत रचता येण्यासारखी आहे. आता यापुढे आणखीहि एक मुद्दा आपण विशेष ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. या मुद्याचा विसर आपणांस वारंवार पडत असतो ही मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. आणि याकरितांच त्याचें चर्वितचवणहि इष्ट आहे. धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हे तत्त्व आपण केव्हाही विसरू नये. प्रत्यक्ष अनुभवाशिवाय बाकीच्या साऱ्या गोष्टी फोल आहेत. अमुक गोष्टीवर विश्वास ठेविला म्हणजे सारा धर्म त्यांत आला असें नाहीं. पाश्चात्य धर्माची ही व्याख्या आम्हांस कधीहि मान्य होण्यासारखी नाही. जन्मादारभ्य ही व्याख्या आम्हांस कोणी पढविली नाही. 'नर करनी करे तो नरका नारायण होय' हा सिद्धांत आमच्या बाल्यापासून आमच्या कानांवर आदळत आहे. आमचे जे काही स्वरूप आजमितीस आहे, ते आमच्या प्रत्यक्ष कृतीचें फल आहे. कांहीं सिद्धांतांवर आणि धर्ममतांवर नुसता विश्वास ठेवून तुमचे काम भागणार नाही. अशा विश्वासाची फारशी मदत तुम्हांस होणार नाही. अत्यंत प्राचीन काळी अनुभूती हा एकच शब्द आकाशवाणीने आम्हांस सांगितला आहे. अनुभवाशिवाय धर्म नाही हे वचन आमच्या धर्मग्रंथांशिवाय इतरत्र कोठे आढळावयाचें नाहीं. परमेश्वराची प्रत्यक्ष भेट घ्या असा उपदेश आमच्या धर्मग्रंथांशिवाय कोणीहि केलेला नाही. हे शब्द तुम्हांस कदाचित् फाजील धार्ष्ट्याचे वाटतील, पण त्यांत असत्याचा लेशहि नाही. ते अक्षरशः खरे आहेत, अशी दृढ श्रद्धा तुम्ही बाळगा. ते प्रत्यक्ष अनुभवाचे शब्द आहेत. त्यांतील प्रत्येक ध्वनि आणि प्रत्येक स्पंदहि खरा आहे. धर्म म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेणे. नुसतें श्रवण म्हणजे धर्म नव्हे. काही शब्द पाठ करून पोपटासारखे तोंडाने बडबडणे म्हणजेहि धर्म नव्हे. धर्म म्हणजे बुद्धिवाद नव्हे. या सर्ववस्तूंना खरोखर यत्किंचितहि किंमत नाही. धर्माचा प्रवेश आपल्या अंतःकरणांत होऊन तेथे त्याचे प्रत्यक्ष दर्शनच झाले पाहिजे. आपल्या बुद्धीला पटतें म्हणून परमेश्वराचे अस्तित्व मानावयाचे, हे त्याच्या अस्तित्वाचे निश्चित प्रमाण नव्हे. परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन आपल्या पूर्वजांना झाले आणि असे दर्शन घेतलेले लोक आजच्या काळीहि अस्तित्वात आहेत, हेच त्याच्या अस्तित्वाचे खरें प्रमाण. आत्म्याला अस्तित्व आहे असे आपण मानतों; पण मानण्यावरून<noinclude></noinclude> truy56842w1q0wo86tru3yois986lcr पान:स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ - नवम खंड.pdf/२७४ 104 66839 233309 156807 2026-07-19T09:18:06Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 233309 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" />{{rh|खंड.]|हिंदु धर्मातील सामान्य सिद्धान्त.|२६९ }} {{rule}}</noinclude>त्याचे अस्तित्व सिद्ध होत नसून त्याचे दर्शन पूर्वी प्रत्यक्ष घडलें आहे, आज प्रत्यक्ष घडत आहे, आणि भविष्यत्कालींहि हजारों लोकांस तें घडेल म्हणूनच तें खरे आहे. आत्मानुभव घेतलेले लोक पूर्वी होऊन गेले आणि पुढेहि हजारों होतील. असा आत्मानुभव घडल्याशिवाय मुक्ति हा शब्दहि उच्चारणे वायफळ आहे. याकरितां साऱ्या गोष्टींच्या आधी हा मुख्य महत्वाचा मुद्दा आपण ध्यानांत धरूं या. हा मुद्दा जो जो अधिक विस्तृत प्रमाणाने सामान्य जनांस पटत जाईल, तो तो पंथ आणि पोटपंथ आपोआप कमी होत जातील. ज्याने परमेश्वराचे दर्शन घेतले असेल तोच एकटा धर्मज्ञ ही गोष्ट सर्वांस कळेल. त्याचीच हृदयग्रंथि तुटून गेली असून, त्याचेच सर्व संशय छिन्न झाले आहेत हे निःसंशय समजावें. कर्मफलांतून फक्त त्याचीच मुक्ति होते. दूरांतदूर आणि जवळांत जवळ, अणूहून लहान आणि आकाशाहून मोठा अशा परमेश्वराचे दर्शन ज्याला घडले असेल तोच खरा मुक्त. नुसती बडबड म्हणजें धर्म असा भ्रम आपल्या बुद्धीला पुष्कळ वेळां होतो. मोठा बुद्धिवाद करून आपला पक्ष स्थापित करणाऱ्या मनुष्याला आपण भ्रमाने धर्मज्ञ समजतों आणि यामुळेच धर्म ह्मणजे बडबड असें वाढू लागून अनेकपंथ निर्माण होतात, आणि पुढे भांडणे उपस्थित होतात. आत्मानुभव हेच काय तें धर्मज्ञान, हे तत्त्व एकवार आपल्या बुद्धीला पटलें म्हणजे आपली प्रगति किती झाली आहे, याचा शोध आपल्याच अंतःकरणांत आपण करूं लागू, आणि त्याच वेळी सत्यवस्तूपासून आपण किती लांब आहों हेहि आपणांस कळेल; मग आपण स्वतःच अंधारांत चांचपडत आहों असे आपल्यास दिसून येईल. स्वतः अशा स्थितीत असतां लोकांस धर्म सांगण्याची इच्छा आपण करतों हे आपलें मूर्खत्व आहे असे आपणांस कळून येईल. अशा स्थितीत पंथ आणि पंथांची भांडणे ही जीव धरूं शकणे शक्य नाही. मी अमुक पंथाचा ह्मणून मोठा धर्मज्ञ असें म्हणणाऱ्या माणसास मी एकच प्रश्न विचारितों की, बाबारे, तूं प्रत्यक्ष परमेश्वराची भेट घेतली आहेस काय? तुला आत्मानुभव झाला आहे काय? तसें नसेल तर त्याच्या नांवानें बडबड करण्याचा तुला अधिकार काय? तूं स्वतः अंधारांत चांचपडतोस आणि लोकांना त्याच अंधाराकडे नेऊ पाहातोस हे तुझें कृत्य शहाणपणाचे आहे काय? आंधळ्याने आंधळ्याला चालवावें आणि शेवटी दोघांनीहि खाड्यांत पडावें तशांतलेंच हे तुझें कृत्य. {{nop}}<noinclude></noinclude> cvsxxyko6x70z64o3kp131zskvm7vib सदस्य चर्चा:शैलेश सर्वोदयी 3 111029 233288 2026-07-18T17:38:45Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 233288 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=शैलेश सर्वोदयी}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २३:०८, १८ जुलै २०२६ (IST) kamqmc76zada2hscd2iyzfh7cmcuz4c