विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.12 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/59 104 26088 233764 142342 2026-07-27T15:32:19Z कल्पनाशक्ती 3813 233764 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>''' ‘संस्कृति के चार अध्याय': समन्वित संस्कृतीचे स्वप्न आणि सत्य''' {{gap}}रामधारी सिंह 'दिनकर' हिंदी साहित्यात कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. पण त्यांनी काव्याबरोबर निबंध, समीक्षा, इतिहास, संस्कृतीसंबंधी विपुल गद्य लेखन केलं आहे. त्यांच्या संस्कृति के चार अध्याय' (१९५६) या हिंदी ग्रंथामुळे त्यांना साहित्य आणि इतिहासाचे विश्लेषक म्हणून भारतभर मान्यता मिळाली. ही मान्यता मिळून चर्चा व्हायला दोन कारणे झाली. एकतर या ग्रंथास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. दुसरे असे की तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंची या ग्रंथास प्रस्तावना लाभली होती. तत्पूर्वी नेहरूंची त्यांचा इतिहास व्यासंग सिद्ध करणारी दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. एक होते ‘ग्लिम्सस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी' (१९३९) तर दुसरे होते ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया' (१९४५) या पार्श्वभूमीवर या ग्रंथास लाभलेल्या प्रस्तावनेस असाधारण महत्त्व होते. दिनकर यांच्या जीवन व विचारांवर महात्मा गांधींचा प्रभाव होता. तो ‘बापू' या त्यांच्या काव्यातून स्पष्ट होता. 'संस्कृती के चार अध्याय' ग्रंथाच्या विवेचन, विश्लेषणातूनही दिनकरांचा गांधीवादी दृष्टिकोन स्पष्ट होतो. दिनकरांची गांधीवाद, समाजवाद व मानवतावादावर श्रद्धा होती. असे असले, तरी भारतीय इतिहास व संस्कृतीबद्दल जाज्वल्य अभिमान ज्वलंत राष्ट्रप्रेम, दलित व पीडित जनतेबद्दल अपार आस्था ही त्याच्या लेखनाची बलस्थाने होती. सामान्यांविषयी कणव या ग्रंथ लेखनामागे आहे. ग्रंथाच्या भूमिकेत आपण हा ग्रंथ जनसामान्यांसाठी लिहिलेला आहे याची त्यांनी स्पष्ट शब्दात कबुली दिली आहे. दिनकर बिहारमध्ये जन्मले, वाढले, शिकले, बिहारच त्यांची कर्मभूमी राहिली. मुख्याध्यापक, प्राध्यापक, कुलगुरू अशा साच्या भूमिका त्यांनी बिहारच्या भागलपूर, पटना, मुंगेर जिल्ह्यात वठवल्या. डॉ. राजेंद्रप्रसाद<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/५८}}</noinclude> 15qlxs7hgb9l6vexqeekmaisjgp5vj1 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/60 104 26089 233765 142343 2026-07-27T15:33:54Z कल्पनाशक्ती 3813 233765 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय काँग्रेसच्या झेंड्याखाली सक्रिय होते. त्यांचे अस्पृश्यतोद्धार, भूकंप निवारण कार्य दिनकरांपुढे अनुकरणीय आदर्श म्हणून होता. त्यामुळे दिनकरांनी 'संस्कृति के चार अध्याय' ग्रंथ डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या सामायिक सांस्कृतिक प्रतिमेस अर्पण केला आहे. {{gap}}'संस्कृति के चार अध्याय' ग्रंथाच्या भूमिकेत दिनकरांनी हे स्पष्ट केले आहे की, साहित्य अध्यापन करताना त्यात इतिहासाचे वारंवार संदर्भ येत. ते विद्यार्थ्यांना समजावून सांगताना प्राचीन साहित्य आधुनिक संदर्भात विशद करताना त्यांना आपल्या व पूर्व ग्रंथांच्या, संदर्भाच्या मर्यादा जाणवायच्या. या मर्यादा पूर्व संदर्भ ग्रंथांच्या होत्या. तशाच आकलन, विश्लेषणाच्याही पूर्व. इतिहास ग्रंथ वेगवेगळ्या दृष्टीने लिहिलेले त्यांना दिसून आले. स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा विचार करताना सामाजिक रचनेचं नवं भान त्यांना आवश्यकच नाही, तर अनिवार्य वाटू लागलं होतं. इतिहासाचा विद्यार्थी म्हणून त्यांना याची जाणीव प्रकर्षानं झाली की आपली प्राचीन संस्कृती प्रारंभापासूनच सामासिक (संयुक्त/मिश्र) राहिली आहे. इथे वेगवेगळ्या जात, धर्म, वंश, भाषा, परंपरा निरंतर विकसित होत राहिल्या आहेत. वैविध्यातून, संघर्ष आणि आक्रमण, अत्याचार, शोषण, धर्मांतरांचे अनेक प्रयोग होऊनही इथे एकता टिकून राहिली. त्याचं कारण इथे सामासिक (सामाजिक नव्हे!) संस्कृती घट्ट पाय रोवून उभी आहे म्हणूनच. पण खरेदाची गोष्ट अशी की पूर्व इतिहासकारांनी या गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. त्यांची परिपूर्ती, भरपाई म्हणून त्यांना भारतीय इतिहासाबरोबरच अथवा इतिहासाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक विकासाची चिकित्सा करणे आवश्यक वाटले. वर सांगितल्याप्रमाणे सामन्यांसाठी लिहिलेल्या या ग्रंथांचे आधार, संदर्भ मात्र पूर्वसुरी इतिहासकारांचे लेखनच राहिले. आपलं लेखन म्हणजे या पूर्वसुरींच्या विद्वत्तापूर्ण विवेचनाची उष्टावळ ठरते. अशी नम्रता ते या ग्रंथाच्या भूमिकेत व्यक्त करतात. त्यास त्यांनी 'उच्छिष्ट' असा शब्दप्रयोग केला आहे. त्यामागे व्यंग-भाव नाही. असेलच तर दृष्टिकोनभेदाचे शल्य! परंतु हा ग्रंथ विषय, आशय, मांडणी, विस्तार (पृष्ठ संख्या ५३२), संदर्भ कोणत्याच अंगाने सामान्य वाचकांचा राहिला नाही ही वस्तुस्थिती आहे. उलटपक्षी हा ग्रंथ बुद्धिवंत, ज्ञानवंत, समाजालाही तो आव्हान ठरला आहे. {{gap}}दिनकर ‘संस्कृती के चार अध्याय' या आपल्या ग्रंथास एकतेचा सैनिक मानतात. आपला ग्रंथ त्यांच्या दृष्टीने इतिहास ग्रंथ नसून साहित्यिक रचना होय. त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर “यह महल (ग्रंथ) साहित्य और<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/५९}}</noinclude> ohbn1lq9dk80bn7g99blz2fg44jyz4h पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/61 104 26090 233766 142344 2026-07-27T15:35:48Z कल्पनाशक्ती 3813 233766 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>दर्शन (तत्त्वज्ञान) का है। इतिहास की हैसियत यहाँ किरायेदार (भाडेकरू) की है। याचा अर्थ असा की त्यांनी हा ग्रंथ इतिहास ग्रंथ म्हणून लिहिला नाही. इतिहासाची येथील उपस्थिती गौण आहे. ग्रंथाचे महत्त्वाचे पक्ष तात्त्विक व साहित्यिक आहेत. तरी परंतु वाचकांपुढे हा ग्रंथ भारताचा मनुष्य जन्मापासून ते भारत स्वातंत्र्यापर्यंतचा विस्तृत इतिहास काळ जिवंत करतो. या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य राहिले आहे ते भूमिकेतून स्वतः दिनकरांनीच विशद केलं आहे. ते असे की सर्वसाधारणपणे इतिहासकार आपल्या लेखनात विशिष्ट शैलीचा अंगिकार करत असतो. शिवाय तो ज्ञान, विज्ञानाच्या एखाद्याच शाखेत पारंगत अथवा प्रवीण असतो. त्यामुळे त्याच्या लेखनास आपसूकच एक मर्यादा येते. तो अवशेष, नाणी, जीवावशेषात अडकून राहात जुनेच नव्याने सांगत रहातो. इतिहासाचा सांस्कृतिक अन्वय विशद करणारा माझ्यासारखा लेखक केवळ पुराव्यात अडकून न राहिल्याने कल्पना, तर्काच्या आधारे तो अधिक सजीव, संभाव्य शक्यता अथवा सत्याजवळ जातो असे त्यांचे म्हणणे होते. माझ्या मते, या म्हणण्याला भाबडेपणा म्हणता येणार नाही. त्याच काळात जगात (१९५०) 'डिफरन्शियल इक्वेशन्सवर काम सुरू झाले होते. गणिताच्या क्षेत्रात जॉन नॅश यांनी अलीकडच्या काळात ‘गेम थिअरी' मांडली. तिला १९९४ ला नोबेल मिळवून जगमान्यता लाभली. मूळ गणितातील संकल्पना आज अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास सर्व क्षेत्रात वापरली जाते. ‘गेम थिअरी' द्वारे संघर्ष, सहकार्य आणि मनुष्य वर्तन अशा व्यापक क्षेत्रात भाकिते शक्य झाली आहेत. ही थियरी पन्नास वर्षांपूर्वी लेखनात वापरून दिनकरांनी आपले द्रष्टेपण सिद्ध केले आहे. {{gap}}पंडित नेहरूंनी दिनकरांच्या या ग्रंथलेखनाची मार्मिक मीमांसा या ग्रंथास लिहिलेल्या आपल्या प्रस्तावनेत केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दिनकरांनी लेखनासाठी सर्वथा नवा विषय नि दृष्टिकोन स्वीकारला आहे. संस्कृती नि इतिहास हा व्यापक विषय असून कोणीही एक व्यक्ती त्यास पूर्ण न्याय देऊ शकत नाही. यापूर्वी संस्कृतीची व्याख्या अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची त वरीलप्रमाणेच झाली. नेहरूंच्या म्हणण्यानुसार ‘संस्कृतीस राष्ट्रीय संदर्भ असतात, तसेच आंतरराष्ट्रीयही पण प्रत्येक राष्ट्राची स्व संस्कृतीविषयी एक धारणा असते. तिचे आकलन एतद्देशीय जितके चांगले करू शकतील, तितके अन्य कोणी करू शकेल याबद्दल मी साशंक आहे.' भारतीय संस्कृती निश्चितच दिनकरांनी प्रतिपादन केल्याप्रमाणे सामासिक असून, तिचा विकास कालौघात होत आला आहे. विद्वानांनी या संस्कृतीचे<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६०}}</noinclude> ermlhhmy6ubo0rh3i358fx22axz6aso पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/62 104 26091 233767 142345 2026-07-27T15:37:59Z कल्पनाशक्ती 3813 233767 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>आकलन आपापल्या परीने केले आहे. पण परिवर्तन कोणीच नेमक्यापणे शब्दबद्ध करू शकलेले नाहीत. ते स्पष्ट करताना नेहरूंनी म्हटले आहे की, 'परिवर्तन एक ऐसी प्रक्रिया है, जो परंपरा के आवरण में लगातार चलती रहती है। बाहर से अचल दिखाई देनेवाली परंपरा भी, यदि जडता और मृत्यू का शिकार नहीं बन गई है, तो धीरे-धीरे वह भी परिवर्तित हो जाती है।" हे संस्कृतीच्या संदर्भातही खरे आहे. नेहरू म्हणतात की भारत बहुवंशीय देश आहे. इथे अनेक वंशांचे लोक आले. स्थिरावले. तेही म्हणतात की आम्ही प्राचीन भारतीयांचे वंशज आहोत. इथल्या माणसात देशीय व परका असा फरक करता येत नाही. जो इथे आहे, तो इथलाच. आपण स्वतःला सहिष्णू म्हणवून घेत असू तर यास पर्याय नाही. आमच्या आचार व उच्चारात अंतर आहे. नव्या पिढीचा प्रश्न तर आणखीनच गंभीर आहे. ही धोक्याची घंटा आहे. भारतातील कोणताच एक गट (जात, धर्म इ.) असा दावा करू शकत नाही की या देशावर त्यांचा एकाधिकार आहे. भारतीय जनतेतील प्रत्येकाचे त्यात योगदान आहे. दिनकरांचे 'संस्कृति के चार अध्याय' हे समजावते व समजायला साहाय्य करते. त्याबद्दल नेहरूंनी दिनकरांची सदर प्रस्तावनेत प्रशंसाही केली आहे. {{gap}}‘संस्कृती के चार अध्याय' ग्रंथात शीर्षकाप्रमाणे चार अध्याय आहेत. पहिला अध्याय ‘भारतीय जनता की रचना और हिंदू संस्कृति का अविर्भाव' विषयाला वाहिलेला आहे. मानव जन्मापासून ते आर्य आणि आर्येतरांच्या मीलनापर्यंतचे विवेचन या अध्यायात करण्यात आले आहे. भारतीय संस्कृतीच्या संदर्भात कळीचा मुद्दा जर कोणता असेल तर भारताचे मूळ निवासी कोण हाच आहे. दिनकरांनी या अध्यायात स्पष्ट केले आहे की आदिमानव काही भारतात जन्माला आला नाही. इथे वेळोवळी अनेक वंशांचे लोक आले. नंतर ते स्थिरावले नि स्थायिकही झाले. निग्रो, पठाण, द्रविड, आर्य, ग्रीक, शक, हूण, यूची, मंगोल, मुस्लीम, तुर्क ही यादी वाचली तरीही सामान्य वाचक चक्रावून जातो. या सर्व वंशीय मिश्रणातून भारतीय संस्कृती निर्माण झाली. ती मूलतः बहुवंशीय राहिल्याने तिचे बहुधर्मीय, बहुजातीय, बहुभाषीक रूप पारंपरिक आहे. इथे गोरे, काळे, पिवळे अशा वा तत्सम मिश्रणाचे लोक आढळतात, हे सारे वास्तव भारताचे बहुवंशीय असणे सिद्ध करते हे खरे आहे की आर्य, द्रविड, मंगोल, आदिवासी येथील आदिम निवासी होते. येथील संस्कृती, प्राकृतोद्भव भाषा वैविध्य पूर्वापार आहे. आजच्या हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, काश्मिरी, तमिळ, तेलुगू, कन्नड, उडिया,<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६१}}</noinclude> 551nqc3atzc9v1obhw8k9w7zt6d282c पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/63 104 26092 233768 142346 2026-07-27T15:39:45Z कल्पनाशक्ती 3813 233768 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>उर्दू भाषा पूर्वी बोली होत्या. प्रत्येक भाषांत अनेक बोली प्रचलित होत्या. त्या त्या प्रांत विशेषातील बोली समूहातून उपरोक्त भाषा तयार झाल्यात. दिनकर वेदास भारताचाच नव्हे तर मनुष्य समाजाचा प्राचीन ग्रंथ मानतात. हे मात्र एकदा तपासून घ्यायला हवे असे वाटते. मोहेंजोदडो (सिंध प्रांत), हडप्पा (पंजाब), नाल (बलुचिस्थान) येथील सांस्कृतिक उत्खननात जे अवशेष आढळून आले, त्यातून हे पुरेसे सिद्ध झाले आहे की आर्य, द्रविड पूर्व काळातपण भारतात मनुष्य वस्ती होती. {{gap}}आर्य, द्रविडांच्या संबंधात विचार करताना दिनकर यांनी असे मत व्यक्त केले आहे की आर्य आणि द्रविडांना भाषिक विकास पाहता द्रविड आर्याच्या पूर्वी भारतात आले असावेत. त्यासाठी ते विविध इतिहासकार, प्राच्यविद्या अभ्यासकांची मते उद्धृत करत आपल्या मतांना बळकटी देतात, 'संस्कृति के चार अध्याय' ग्रंथाचे हे वैशिष्ट्य आहे की ग्रंथ इतिहास, साहित्य तत्त्वज्ञानाच्या आधारे लिहिला गेला असला तरी तो कपोलकल्पित होणार नाही, याची काळजी दिनकर सतत घेत राहतात. संभाव्य सत्याचा परीघ त्यांनी प्रसंगी ओलांडला असे सहसा दिसत नाही. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संदर्भ सूची देऊन (ग्रंथनाम, लेखक, पृष्ठ) आपल्या लेखनास असलेली संशोधनाची वैज्ञानिक शिस्त जागोजागी दिनकरांनी जपल्यानेच या ग्रंथास प्रमाणरूप आलेले आहे. द्रविड कोण होते? आर्यांचे मूळ स्थान कोणते? ऋग्वेदाचा रचनाकाळ काय? भाषा, लिपींचा विकास काय सांगतो? हे सारे मांडत ते आपल्या मांडणीस बळकटी देत रहातात. वैदिक संस्कृती ही आर्य आणि द्रविडांची संयुक्त निर्मिती होय, हे प्रतिपादन करताना दोहोंतील समान व विरोधाच्या बाबी नोंदवत ते निष्कर्षांकडे जातात. केवळ शास्त्रीय नाही तर या दोन्ही वर्गाचे लोक, त्यांचे स्वभाव, परंपरा, ठेवण, समाजरचना, वर्णव्यवस्था इत्यादींचे त्यांनी केलेले विश्लेषण त्यांचा सर्वांगी व्यासंग सिद्ध करतो. जात, धर्म, विवाह, राहणीमान, प्रथा, परंपरांचा दिनकरांचा अभ्यास पुस्तकी नसून मांडणीत निरीक्षण, पर्यटन, चिंतन यातून स्वतःची विकसित जाण ते जागोजागी नोंदवतात. त्यामुळे या ग्रंथास दिनकरांच्या वैचारिक बैठकीचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे व शिवाय ते पुरोगामी दृष्टीचे आहे, हे लक्षात येते. 'भारतीय संस्कृती' सारखे याच विषयांवरचे साने गुरुजींचे पुस्तक हा ग्रंथ वाचताना प्रकर्षानं आठवत राहतं. साने गुरुजीमधील भाबडेपणा, हळवेपणा, प्रेम इथे नाही. असेलच तर इतिहासकारांचा कठोरपणा आणि तटस्थता, पण त्यात कोरडेपणा कुठेच<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६२}}</noinclude> 9yommzw7e78mf1kqu6230rd3x9q64qv पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/64 104 26093 233769 142347 2026-07-27T15:41:41Z कल्पनाशक्ती 3813 233769 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>नाही. सनावळ्यात, संदर्भात दिनकर अडकून राहत नसल्याने 'संस्कृति के चार अध्याय' ग्रंथ ओजपूर्ण झाला आहे. इतिहास संस्कृतीसारखा विषय विश्लेषणातून ते मांडायचे पण कुठेही रटाळपणा येऊ न देण्याचे कौशल्य दिनकरांमध्ये येऊ शकले, तर केवळ त्यांच्या काव्यमय भाषेमुळे. त्यांच्या जाज्वल्य देशप्रेमाचीपण ती खूण म्हणायला हवी. लेखनामागची ऊर्मी शैलीतून ओघवती होत गेली आहे. संस्कृत काव्यात ब्राह्मण, शूद्र, नारी यांचं नेमकं काय स्थान होते याची दिनकरांनी केलेली मीमांसा त्याचे संस्कृत ग्रंथांचे वाचन किती सूक्ष्म होते, ते स्पष्ट करते. विशेषतः जेव्हा ते चपखल संस्कृत सुभाषिते, ऋचा, श्लोक, काव्यपंक्ती, पुरावे म्हणून उधृत करतात, त्यातील निवडीचा विवेक एखाद्या वकिलाच्या बिनतोड युक्तिवादाप्रमाणे वाटतो तेच त्यांच्या या लेखनाचं वस्तुनिष्ठपण ठरते. 'यत्र नार्यस्तु पूज्यन्ते' 'क्रुद्धो ब्राह्मणो हन्ति राष्ट्रम्' 'जन्मना जायते शूद्रः' ही प्रचलित उदाहरणे खरी पण ती चपखल ठिकाणी वापरण्याच्या कौशल्यातून हा ग्रंथ सर्वसामान्यांसाठी एका विशिष्ट पातळीपुढे कठीण वाटणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली आहे. ही लेखन शैली सदर ग्रंथ सामान्यांना वाचनिय ठरावा म्हणून केलेली कसरत असली तरी त्यातून लेखकीय बांधिलकी अधोरेखित होते. भारताचे प्राचीन ग्रंथ, त्यातील देव-देवता, कथा, चरित्रे यांचा केलेला पहिल्या अध्यायातील ऊहापोहपण त्यांच्या समन्वयवादी वृत्तीचं प्रतीक म्हणूनच पुढे येत राहतो. {{gap}}या अध्यायातील दिनकरांनी नोंदवलेली निरीक्षणे वाचकास अंतर्मुख करत राहतात, येशू ख्रिस्तानी ख्रिश्चन धर्म स्थापन केला. महंमद पैगंबरांनी इस्लाम धर्म. हे धर्म एका व्यक्तीची निर्मिती होय. हिंदू धर्म 'संस्कृत सामासिक का तर ती कोणा एकाची निर्मिती नाही. कालपरत्वे नि प्रांतनिहाय त्यातील बदल, अंतर सदर धर्मास परिवर्तनशील ठरवतो. अन्य धर्मीसारखी कठोरता, अपरिवर्तननीयत या धर्मात नाही. भारतीय संस्कृती म्हणून जे सामासिक रूप आपल्यापुढे येतं, त्यात या धर्माचे प्रतिबिंब व प्रभाव असल्याचे स्पष्ट होते. सर्व हिंदूची एक देवता नसणे किंवा त्याचे बहुदेववादी रूपही भारतीय संस्कृतीस सामासिक बनवते. यात इथली तीर्थस्थळे, उत्सव यांच्या परंपरा, रीतींचाही मोठा वाटा आहे. इथलं जात वैविध्य नि त्यांची म्हणून असलेली बंधने, मर्यादा, परंपरा यांचाही या बहुपेडीय रूपात मोठा वाटा आहे. एतद्देशीय वंशांनी पूर्वीपासून बाहेरून आलेल्या प्रत्येक विचार, व्यवहारांबाबत जे स्वागतशील स्वीकृतीचे धोरण अंगीकारलं आहे, त्यातून<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६३}}</noinclude> m0c0wiyd284hjmok783r1d1hsqlo0v0 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/65 104 26094 233770 142348 2026-07-27T15:44:09Z कल्पनाशक्ती 3813 233770 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>भारतीय संस्कृती व्यापक, उदार, ग्रहणशील बनत गेली. दिनकरांच्याच शब्दात सांगायचं तर, "मानव जाति को भारत वासियों जो सबसे बड़ी चीज, वरदान के रूप में दी है, वह यह है की भारतवासी हमेशा ही अनेक जातियों के लोगों और अनेक प्रकार के विचारों के बीच समन्वय करने को तैयार रहे हैं। और सभी प्रकार की विविधताओं के बीच एकता कायम करने की उनकी लियाकत (योग्यता) और ताकत लाजवाब रही है।" (पृ. ८५) पुढे दिनकरांनी या भारतीय गुणांचे वर्णन करताना म्हटलं आहे की, हे विश्व मानवतेसाठीचे मोठं वरदान आहे. दिनकरांनी या अध्यायात भारतीय संस्कृतीत जगाला देण्याचे सामर्थ्य अधोरेखित करून आपल्या संस्कृतीचं श्रेष्ठत्वच अधोरेखित केलंय असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरू नये. {{gap}}'प्राचीन संस्कृति से विद्रोह' शीर्षक 'संस्कृति के चार अध्याय' मधील दुसऱ्या अध्यायात हिंदू धर्मातील कर्मकांडास विरोध करत अस्तित्वात आलेल्या जैन आणि बौद्ध धर्माच्या उगमापासून ते सदर धर्मांमध्ये पंथ भेद कसे झाले, कालौघात विविध पंथ, मतांचा त्यांच्यावर कोणता प्रभाव पडला यांचे विवेचन दिनकर करतात. ते करण्यापूर्वी हे धर्म ज्या विशिष्ट परिस्थितीची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आले, त्यांची लेखकाने इथे कारणमीमांसा केली आहे. वेद, उपनिषद, ब्राह्मण ग्रंथ यांची विचारधारा काय होती, हेही ते स्पष्ट करतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद होते. हे सारे वेद दुसरे तिसरे काही नसून यज्ञ संस्कृतीचा पुरस्कार आहे. शिक्षण, छंद, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष आणि कल्पसूत्र या द्वारे वेदपठण, गायन, उच्चारण संबंधी नियम, चौकट, शिस्त प्रकट करण्यात आली आहेत. या कठोर शिस्तीतूनच व वेदांच्या ब्राह्मणी एकाधिकारातून ही शास्त्रे कर्मठ तर बनलीच पण त्यांनी माणसामाणसात उच्च नीचता रुजवली. ब्राह्मण ग्रंथ तर 'नीरस' असल्याने दिनकरांनी नमूद केले आहे. (पृ.९२) ब्राह्मण ग्रंथांबरोबर उपनिषदे, अरण्यके यांचीही नोंद दिनकर घ्यायला विसरत नाहीत. दिनकरांच्या मतानुसार, बृहदारण्यक, छान्दोग्य, केन, ऐतरेय, कौषी तकी, तैत्तरीय ही उपनिषदे अन्य काही नसून ती अरण्यकांची परिशिष्टे होत, असे नमूद करून दिनकर त्यांचे महत्त्व नाकारतात. (पृ. ९२) वेद निसर्गातील इंद्र, वरुण, अग्नि, सविता यांना देवता मानत. ते निसर्ग व मानवी जीवन संबंधांची चर्चा करतात. वेदाचे विकसित रूप म्हणजे उपनिषदे! वेदांमध्ये सर्वाधिक म्हणजे सुमारे साडे तीन हजार मंत्र एकट्या इंद्रावर रचले गेलेत. त्यानंत अग्निचा क्रम येतो. वेदांमध्ये अवतारवादाचे वर्णन नाही. यज्ञ आणि कर्मकांड. ही नि अशी<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६४}}</noinclude> sapr6r9px3hg9vqfh3psut367sc2zi8 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/66 104 26095 233771 142349 2026-07-27T15:46:14Z कल्पनाशक्ती 3813 233771 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>अनेक विधान करत दिनकर त्यांची साद्यंत माहिती देतात व दुसरीकडे त्यांचं वैयर्थही समजाविण्यास विसरत नाहीत. या सर्वांची चर्चा ते जैन व बौद्ध धर्म निर्मितीमागील पार्श्वभूमी म्हणून करतात, हे वाचकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. {{gap}}'जैन व बौद्ध धर्मांची स्थापना म्हणजे वैदिक धर्माविरोधी केलेला विद्रोह होय.' (पृ.१०४) हे निःसंदिग्ध शब्दात सांगताना दिनकर कचरत नाही. त्यातून या लेखकाचं प्रागतिकपणा स्पष्ट होतो. 'संस्कृति के चार अध्याय' ची चर्चा पन्नास वर्षे होऊन गेली, ती लेखनाच्या हीरक महोत्सवी उंबरठ्यावर उभा असतानाही होत राहते. याचं कारण या ग्रंथाची वैचारिक बैठक पुरोगामी आहे म्हणूनच! जैन व बौद्ध धर्म कर्मकांड विरोधात जन्मले तरी विकास, प्रचार, प्रसारानंतर त्यांनाही कर्मकांड कसे ग्रासले, त्यांची शकले-पंथभेद दिगंबर- श्वेतांबर अथवा महायान- हीनयान कसे झाले हे सांगायला ते विसरत नाहीत. ही असते दिनकरांची तटस्थता व वस्तुनिष्ठताही! {{gap}}ज्या काळात भगवान महावीर जन्मले, गौतम बुद्धाचा अविर्भाव झाला त्याच काळात जगातील अनेक धर्माचे संस्थापक, तत्त्वचिंतक, गणिती जन्माला आले. चीनमध्ये लाव-जे, कन्फ्यूशियस, ग्रीसमध्ये पायथागोरस, इराणमध्ये झरतुष्ट्र, पॅलेस्टाईनमध्ये युरेमिया, इजकील या सर्वांचा काळ एकच. हा योगायोग नव्हे, तर तत्कालीन कर्मठपणाविरोधाचा तो बुद्धिवादी व संवेदनशील उद्गार व उद्रेक होता. या मांडणीतून धर्मोद्धारक व चिंतन हे मुळात समाज हितवर्धक असतात, हे आपण लक्षात घ्यायला हवे. यज्ञांचे समर्थन करणाऱ्या ब्राह्मणांविरुद्ध यज्ञास अनुपयोगी ठरवणारे जैन श्रमण जन्मतात ही आस्तिक अतिरेकाच्या टोकाची नास्तिक प्रतिक्रिया होय. 'नास्तिको वेद निंदकः' म्हणण्याच्या काळात भगवान महावीर व भगवान बुद्ध ब्राह्मणांच्या जागी सामान्य माणसांचे महत्त्व सांगत लोकायत परंपरा निर्माण करतात. यज्ञ ही हिंसा आहे.... निसर्गाची व जिवांचीही! ती परंपरा कृषक् विरोधी आहे, आजच्या भाषेत पर्यावरण विरोधी आहे, हे बिंबवण्यात हे दोन्ही धर्म यशस्वी ठरले. त्यात जैन धर्म कर्मठ राहिल्याने आकसत जाऊन तो हिंदू धर्माचाच एक भाग बनून राहिला. उलटपक्षी उदारवादी दृष्टिकोनामुळे बौद्ध धर्म जागतिक झाला. जपान, चीन, थायलंड, नेपाळ, तिबेटादी देशांचा तो धर्म बनून राहिला. अशा तुलनेतही दिनकर धर्माचे उदार असणे, परिवर्तनशील असणे आवश्यक कसे असते हे समजावतात. जैन धर्म म्हणजे अहिंसा आणि तप यांचा समन्वय. तो चार्वाक आणि बौद्ध तत्त्वज्ञानाप्रमाणे नास्तिकतेवर<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६५}}</noinclude> mqwenhsmakkiop58wxrjm6yeyfc9m2n पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/67 104 26096 233772 142350 2026-07-27T15:48:05Z कल्पनाशक्ती 3813 233772 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>उभा आहे. जीव, पुदगल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल ही या धर्माची प्रमुख सहा अंगे होत. या धर्मात मोक्ष साधनेचा अधिकार फक्त साधूना असल्याने धर्मात साधू, साध्वींना असाधारण महत्त्व आहे. हा धर्म अनेकांतवादास मान्यता देतो. जैन धर्माची तत्त्वे कालांतराने हिंदू धर्माने स्वीकारल्याने या धर्माचे विशेष स्थान राहिले नाही. हा लेखक निष्कर्ष महत्त्वाचा खरा! {{gap}}सुगम आणि सुबोधतेच्या पायावर उभा असलेला बौद्ध धर्म, जैन धर्मानंतर उदयास आला. या धर्माच्या आर्य सत्य नि अष्टांगिक मार्गाची दिनकरांनी 'संस्कृति के चार अध्याय' मध्ये व्यापक चर्चा केली आहे. या धर्मात असलेले वैदिक धर्मातील साम्य सांगायला दिनकर विसरत नाहीत. ते हेही विशद करतात की, हा प्रामुख्याने ‘आचारधर्म' आहे. हा धर्म हिंदुत्त्वाचे बौद्धिकीकरण होय. बुद्धाचा धर्मावरील प्रभाव आजही टिकून आहे. पण पडझड झाली ती आचरण, व्यवहारात. राजाश्रमामुळे, श्रमण, भन्ते, मठ, मंदिरे ऐश्वर्याची व विलासाची केंद्रे बनली. भगवान महावीर चांदीचा तर भगवान बुद्ध सुवर्णमय बनून जाणे, मूर्ती, मंदिरांचा, स्तुपांचा अतिरेक यामुळे मूळ धर्म तत्त्वांचाच पराभव झाला. अंध विश्वासाचा विरोध करणारे धर्म त्याचेच शिकार झाले. हे पतन विसंगतीचे अपत्य होय, हे दिनकरांचे अनुमान क्लेषकारक वाटते. पण कठोर सत्य म्हणून स्वीकारण्यास पर्यायही उरत नाही. {{gap}}दिनकरांनी या अध्यायातील 'वैदिक बनाम (विरुद्ध) बौद्ध मत' प्रकरणात गांधीवाद, मार्क्सवाद, शून्यवाद इत्यादी विचारधारांची चर्चा करत जैन व बौद्ध धर्म विस्तार व प्रसाराच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. 'श्रीमद्भगवद्गीता', गणित, ज्योतिष, सर्वांची विवेचना करत दिनकरांचं विज्ञानापाशी येऊन थांबणे यात त्यांच्या विचारांचे व्यापक क्षितिज नुसते स्पष्ट होत नाही, तर ग्रंथ लेखनाच्या मूळ उद्दिष्टांचं भान ठेवत हा लेखक सतत आपल्यातील विवेकी विश्लेषक, तर्कशास्त्री सजग ठेवतो. याची वारंवार होणारी जाणीव अप्रत्यक्षपणे वाचकालाही जागरूक बनवत राहते. हे या ग्रंथाचे फलित व योगदान म्हणून नोंदवावेसे वाटते. भारतीय धर्माच्या वैश्विक प्रसाराचा भूगोल दिनकरांना चांगला माहीत असल्याने ते मांडत असलेल्या सांस्कृतिक इतिहासास यथार्थता प्राप्त होते. बाली, सुमात्रा, बोर्निओ, हिंद-चीन, कंबोडिया, ब्रह्मदेश (म्यानमार), सयाम, जपान येथील भारतीय धर्मप्रसाराचा जो विस्तार दिनकर स्पष्ट करतात त्यातून त्यांचे संस्कृतीसंबंधी वैश्विक भानही स्पष्ट होते. आश्चर्य वाटतं की हा माणूस<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६६}}</noinclude> s2layblwcexjrchz7m9fzr1couwnmkv पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/68 104 26097 233773 142351 2026-07-27T15:50:56Z कल्पनाशक्ती 3813 233773 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>इतकी सारी ज्ञानविज्ञाने, धर्म- तत्त्वज्ञानं, इतिहास-भूगोल, अध्यात्म नि विज्ञान एकाच वेळी समतोलपणे कसा पेलू शकतो? शोध घेता लक्षात येतं की, दिनकर एक लेखक, कवी, विचारक, इतिहासकार म्हणून मुळात समन्वयवादी वृत्तीचे उपासक व समर्थक होत. त्यामुळेच त्यांना ते शक्य होतं. {{gap}}बौद्ध धर्माचा जगातील प्रभाव का कमी झाला याची साक्षेपी समीक्षा दिनकर यांनी 'संस्कृति के चार अध्याय' या ग्रंथात केली असून ती मांडणी विचार व विश्लेषणाद्वारे वाचकांना अपेक्षित तार्किक निकषाकडे नेण्याइतकी प्रभावी आहे. पाण्यात जसे शेवाळ निर्माण होते. तसे बौद्ध धर्मांतर्गत विसंगती निर्माण झाली. महायान व हीनयान, शैव आणि शाक्त अशा पंथभेदांमुळे बौद्ध धर्मही कर्मकांडी बनला. योग्य परिणती तंत्रमार्गात झाली. रुदन, गायन, विलाप इत्यादींद्वारे ईश्वरास प्रसन्न करण्याचे उपाय अस्तित्वात आले. तंत्र, मंत्र, चमत्कार, भस्म इ. ना साधनेत महत्त्व आले. बळी, संभोगसारखे अघोरी प्रकार हा साधनेचा व पापमुक्तीचा, संकटमोचनाचा मार्ग बनला. यातून हठयोग जन्माला येऊन पाण्यावरून चालणे, ईश्वराचा अंश बनणे असे अतर्क परंतु तत्कालीन अशिक्षित जनतेत भय, गंड निर्माण करणारे उपाय साधना बनली. कुंडलिनी जागृती, विपरीत मार्ग अवलंबन यातून बौद्ध धर्म मूळ उद्दिष्टांविरोधी कृतींनी ग्रासून गेला. गुह्य समाज निर्मितीच्या अट्टाहासाने मंत्रयान, सहजयान, हीनयान, कालचक्र यान, वज्रयान, तंत्रयान असे तुकडे होत होते. मूळ केव्हा लयाला गेला हे अनुयायांनाही कळाले नाही. दिनकरांनी हे सारे विश्लेषण बिनतोड युक्तिवादाद्वारे परिणामकारकपणे केले आहे. जसा विघटन प्रवास जैन धर्माचाही झाला. त्याचीही सविस्तर चर्चा या अध्यायाच्या शेवटच्या प्रकारणत दिनकरांनी केली आहे. {{gap}}जैन व बौद्ध धर्म अनुयायी वेद, ब्राह्मण, जातिप्रथा यांच्या त्राग्यातून हिंदू धर्मापासून दूर झाले होते. पुढे इस्लाम धर्माच्या आगमनामुळे त्यांना हिंदू, बौद्ध व जैन या तिन्ही धर्मापेक्षा इस्लाम धर्म सुबोध वाटला. परिणामी हिंदू मतावलंबी मोठा समाज धर्मांतराचा बळी ठरून इस्लामी झाला. दिनकरांनी या अध्यायात हिंदू पाया असलेल्या धर्म विचारधारेच्या या विवेचनातून विसंगती अधोरेखित केली आहे. {{gap}}हिंदू-मुस्लीम संबंध खरेतर सर्वांगांनी समजून घ्यायचा विषय आहे. या दोन्ही धर्मावर त्या त्या वा अन्य धर्मीयांकडून विपुल लेखन झाले आहे.<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६७}}</noinclude> 1xebzqqidqt8ultjmvrclusjiro2hmm पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/69 104 26098 233774 142352 2026-07-27T15:53:01Z कल्पनाशक्ती 3813 233774 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>अधिकतर प्राचीन लेखन पक्षपातीच म्हणायला हवे. पूर्वी जात, धर्म यांना टोक होते. परधर्मीय परजातीय सहिष्णुतेचा विचार आदर्श असला, तरी समाज व्यवहार बंदिस्त होते. यातून एक बंदिस्त मानसिकता उदयाला आली होती. दुर्दैवाची गोष्ट अशी की, इतक्या वर्षांच्या अनुभव, शिक्षणातून त्यात फारसा फरक पडलेला नाही. डॉक्टर ताराचंद आणि हुमायू कबीर यांनी हिंदुत्वावरील इस्लाम परिणामाविषयी लिहिले आहे. एक तर ते अतिशयोक्त आहे आणि विपर्यस्तही! इतिहासकारावर एक सामाजिक समन्वयाची जबाबदारी असते, ती इथे अभावाने दिसते. त्या तुलनेने पाहायचे झाले तर प्राचीन कवी अमीर खुसरो, कबीरदास अधिक जबाबदारीने लिहीत होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. जायसी, कुतुबन, मंझन, मुसलमान कवी होते. पण त्यांच्या लेखनाची बैठक उदार होती. खुसरो, कबीरांनी वापरलेली भाषा, लिपी सर्वांना घेऊ जाणारी होती. आशय अधिक उदार होता, हे वेगळे सांगायची गरज नाही. दिनकर जेव्हा हे सारं विवेचन करतात, तेव्हा त्यांना पण पूर्वसुरींचे हे भान होतं, ते लक्षात येते. याची कारणमीमांसा करताना दिनकर हे स्पष्ट करतात की या सर्वांवर औरंगजेबापेक्षा उदारवादी लेखकांवर अकबराचा प्रभाव अधिक होता. सन १९४७ ला भारत-पाकिस्तानचे विभाजन ज्या फुटीर वृत्तीमुळे झाले, त्याची बीजे आपणास शेख अहमद सरहिंदींच्या लेखनात आढळतात. औरंगजेबाच्या कृतिकार्यक्रमाचा पाया (धार्मिक अत्याचार, जिझिया, धर्मातर इ.) शेख अहमद सरहिंदींचे विचार होते, हे दिनकरांचे मूल्यमापन व आकलन पुढील काळाच्या संदर्भात वृत्तीद्वारेच आढळून येते हा अभ्यास वाचताना दिनकरांची ऐक्याविषयीची आस्था अधिक प्रखर होते. हा अध्याय दिनकर विशेष तळमळीने लिहितात, हे लक्षात आल्यावाचून राहात नाही. {{gap}}सदर अध्याय दिनकरांनी विस्ताराने लिहिलाय त्यावर त्यांनी सुमारे १५० पाने खर्ची घातली आहेत. इस्लामच्या पहिल्या भारत संपर्कापासून ते स्वातंत्र्यपर्यंतच्या हिंदू-मुस्लीम संबंध, संघर्ष, संबंध, परस्पर आदान-प्रदान उभयपक्षी प्रभाव या सर्वांची चर्चा प्रस्तुत अध्यायांत आहे. विविध बारा प्रकरणांमधून दिनकर इस्लाम धर्म, कुराण, धर्माचरण, धर्मप्रसार यांची तर चर्चा करतात, पण भारतीय संदर्भात ते हिंदू, शीख धर्म आणि त्यांच्या इस्लामशी झालेल्या संघर्ष, संवेदना अनुशीलन करतात. भाषा, कला, साहित्य, खानपान, पोषाख, विचार, धर्मपद्धती या सांस्कृतिक अंगानी परस्पर झालेली देवघेव सांगायलाही दिनकर विसरत नाही. अशा मांडणीतून<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/६८}}</noinclude> iyv7ca1y7x4c7n8e7z4cgqxvp49ogyu पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/70 104 26099 233775 142353 2026-07-27T15:54:33Z कल्पनाशक्ती 3813 233775 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>विवेचनात सर्वस्पर्शिता आली आहे. उर्दू भाषेचा जन्म आणि हिंदीचा विकास संबंधी दिनकरांचे या अध्ययनातील लेखन हिंदू-मुस्लिमांच्या वर्तन व्यवहारावर नेमकेपणाने बोट ठेवणारे ठरले आहे, असे असले तरी वास्तवापलीकडे जाऊन दिनकर त्यांना अभिप्रेत असलेल्या सामासिक संस्कृतीचे स्वप्न सोडत नाहीत हे विशेष. {{gap}}इस्लाम धर्माची स्थापना अरबस्तानात झाली. धर्म स्थापून ऐंशी वर्षही झाली नसतील, या धर्माने भारतात पाऊल ठेवले. त्या वेळी हा धर्म कुराण प्रमाण होता. कलमा, नमाज, रोजा, जकात, हज ही त्यांची पंचतत्त्वे होती. मूळ इस्लाम धर्म हा मूर्तिपूजाविरोधी होता. तो एकेश्वरवादी होता. हिंदू धर्म मूर्तिपूजक शिवाय बहुदेववादी हिंदू-मुस्लीम धर्मातील तेढीचे खरे कारण ही स्वरूप भिन्नता आहे. पण कोणतेही दोन धर्म एकमेकांच्या सान्निध्यात येतात, तेव्हा अभिनिवेशाच्या भूमिकेतून संघर्ष होतात, हे खरे आहे. पण स्थायी होण्याने सहअस्तित्वाने कर्मठपणाचे कंगोरे झिजून देवाण-घेवाण व परस्पर सहिष्णुतेची भावना ज्या देशात निर्माण झाली, तिथेच मिश्र संस्कृती उदयाला आली, हा जगाचा अनुभव आहे. {{gap}}या संदर्भात ख्रिश्चन-मुस्लीम, ज्यू-मुस्लीम, ख्रिश्चन -ज्यू असे संबंध पाहता येणे शक्य आहे. भारतात हिंदूप्रमाणे शीख संघर्ष, संवाद, सहवासही दुसरे उदाहरण आहे. प्रश्न आहे की भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर, अनुभवातून वर्तमानात आपण काय बोध घेणार व व्यवहार करणार. दिनकरांनी हा प्रश्न उपस्थित करताच 'संस्कृति के चार अध्याय' चे लेखन केले आहे. {{gap}}या अध्यायात इस्लामी आक्रमणात हिंदू हरले. इस्लामी भाषा, वास्तुशिल्प, प्रशासन, खानपान यावर परिणाम झाला. हिंदू जात व्यवस्थेवर त्याचे परिणाम झाले, ही वस्तुस्थिती आहे. पण हिंदू धर्मक्षय हा अंतर्गत जाती संघर्षामुळेही झालेला आहे, हे दिनकर लक्षात आणून देतात. हिंदू-मुस्लीम संघर्ष, संबंध नुसते पाहून चालणार नाहीत. बुद्ध व ब्राह्मण संघर्षही लक्षात घेणं दिनकरांना आवश्यक वाटते. मुस्लीम आक्रमणानंतर हिंदूची दुर्गती नोंदवताना दिनकरांनी स्पष्ट केलं आहे की, 'जात ठीक तर सर्व ठीक.' धर्म वाचला तर सर्व वाचेल. या हिंदूच्या आडाख्यामुळे त्यांनी देश तर गमावलाच, पण धर्म व जातीचं अस्तित्व असून नसल्यासारखं, स्थितीशील (ठहरसा गया) झालं, ही त्याची खरी शोकांतिका ठरली. याकडे दिनकरांनी ग्रंथात लक्ष वेधले आहे.{{nop}}<noinclude>साहित्य आणि संस्कृती/६९</noinclude> qausfw25hh9tlgouvrlixh8vxao6y8n पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/71 104 26100 233776 142354 2026-07-27T15:56:04Z कल्पनाशक्ती 3813 233776 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}वाईटातून चांगले निर्माण होते म्हणतात, तसे भारतात मध्यकाळात घडलं. जात, धर्म, देव, कर्मकांड यांच्या संघर्षातून भारतात भक्तिकाव्याचा उदय झाला. संत कवींनी आपापल्या परीने सगुण-निर्गुण भक्तिकाव्य लिहिले. ते हिंदूंबरोबर इस्लाम धर्मातही लिहिले गेले. त्यातून राम, कृष्ण, प्रेम, काव्यधारा निर्माण झाल्या. हिंदू-मुस्लीम ऐक्य भावना, कर्मकांड विरोध, राजाच्या जागी ईश्वर स्थापना असे बदल घडून आले. हा काळच सामासिक संस्कृतीचा पाया ठरला. हिंदू व मुसलमान दोन्ही कवींनी एकात्मतेचा पुरस्कार केला. कबीर, जायसी, सूर. {{gap}}इतिहास लेखनात हिंदू धर्मावर इस्लामच्या प्रभावाची चर्चा होत राहते. पण वस्तुस्थिती अशी आहे की इस्लाम धर्मावर हिंदू धर्माचा प्रभाव परिणाम झाला आहे. तो क्षीण असला तरी भारतीय संस्कृती संदर्भात वा ऐक्य, आदान-प्रदान संदर्भात महत्त्वाचा आहे. इराणी तसव्वुफवर वेदान्ताचा प्रभाव आहे. सुफीमताच्या आधारे भारतात जे हिंदी काव्य निर्माण झालं ते सारं मुस्लीम कवींनी लिहिलं आहे. त्या काव्यांची कथानकं हिंदू, चरित्र हिंदू असून धर्मचिंतन मात्र इस्लामी आहे. कवी जायसींप्रमाणे रहीम, रसखान, आलम, मुमताज इत्यादी कवींचं काव्य या संदर्भात पाहता येतं. अमीर खुसरो, कबीरदास, कुतुबन, मंझन इत्यादी कवी तर या संदर्भात आघाडीचेच कवी मानायला हवेत. दिनकरांनी ज्या दृष्टीनं तसव्वुफ या सुफी मतावलंबी विचारधारांकडे पाहिलं व त्याची चर्चा या ग्रंथात केली आहे. त्यातून दिनकरांच्या मनातील हिंदू-मुस्लीम ऐक्य भावना स्पष्ट होते. उलटपक्षी दिनकरांनी 'शंकराचार्य और इस्लाम', 'गुरू परंपरा' ‘अलवार संत', 'वीरशैव मत' अशा विषयांवर स्पष्टीकरणपर लिहून हिंदू धर्मावरील इस्लाम प्रभावही अधोरेखित केला आहे. अशा अनेकविध प्रयत्नांमुळे दिनकर 'संस्कृति के चार अध्याय' पुस्तक समतोल लेखनाचा वस्तुपाठ बनला आहे. अशा प्रकारे या उभय धर्मानी एकमेकांला प्रभावित केले. तरी हा प्रभाव सखोल परिणाम करणारा मात्र ठरला नाही. कारण ही देवाणघेवाण तात्विक व भावनिक पातळीवर एक आदर्श बनून राहिली. हिंदूनी मुसलमानांच्या उदार तत्त्वांचे जसे अनुकरण केले नाही, तसेच मुसलमानांनी अन्य धर्माचा आदर, स्वीकार करण्याची उदारता दाखवली नाही. या उभयपक्षी कर्मठतेमुळेच खरं तर हिंदूमुसलमान दरी राहिली आहे. ती अरुंद व्हायची तर उभयपक्षी सकारात्मक स्वीकारभाव रुजला पाहिजे हे दिनकरांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. त्यात ते कमालीचे वस्तुनिष्ठ होतात. यातच या ग्रंथाचं धार्मिक, सांस्कृतिक उपयोजन सामावलेले आहे.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/७०}}</noinclude> sk4mwo5758muqo29j960loj2atbno9h पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/72 104 26101 233777 142355 2026-07-27T15:57:00Z कल्पनाशक्ती 3813 233777 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}‘भारतीय संस्कृती आणि युरोप' शीर्षक चौथ्या अध्यायात दिनकरांनी युरोपातून व्यापार व साम्राज्य विस्ताराच्या हेतूने भारतात आलेल्या पोर्तुगाल, डच, फ्रेंच आणि इंग्रजांच्या आगमनाचा परामर्श या ग्रंथात घेतला आहे. ग्रंथाच्या प्रास्ताविकात दिनकरांनी स्पष्ट केले आहे की भारतीय संस्कृतीच्या निर्मितीपासून ते स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत भारतात चार सांस्कृतिक क्रांत्या झाल्या. पहिली क्रांती आर्य-आर्येतर संपर्कातून झाली. इथे असलेल्या हिंदू धर्मातील कर्मकांड व ब्राह्मणी प्राबल्याच्या विरोधात जैन आणि बौद्ध धर्माचा उदय म्हणजे जातीय भेदभाव व धार्मिक कट्टरतेच्या विरोधातील सर्वसामान्य माणसास धर्माधिकार प्रदान करणारी व यज्ञ, यागाऐवजी सदाचार, साधेपणास आणि विशेषतः अहिंसा व तपाचे महत्त्व रुजवून माणसास जीवनाभिमुख करणारी, माणसास समाजशील करणारी ही दुसरी क्रांती होय. तिसरी क्रांती मुस्लिमांच्या भारत आक्रमण, धर्मातर व साम्राज्य विस्तारातून घडून आली. भारतीय संस्कृतीस पारंपरिकता, अध्यात्म, जातीय व लिंग भेदभावनांतून मुक्त करून शिक्षण, विज्ञान, सुधारणा, इहवादाद्वारे आधुनिक व पुरोगामी बनवणारी चौथी क्रांती म्हणजे युरोपियनांचे देशातील आगमन! व्यापार, दळणवळण विस्तार, शिक्षण, प्रसार व भारतीय सांस्कृतिक संचिताचे दस्तावेजीकरण (Documentation). पूर्व क्रांत्यांतून संस्कृती विकासाचे कार्य झाले. मुस्लीम शासन काळात मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झाली. पण इंग्रजांच्या काळात मुद्रणालयांचे आगमन झाल्याने वृत्तपत्र प्रकाशन, ग्रंथ प्रकाशनास गती येऊन भारतीय समाज गतीने आधुनिक झाला. सर्व भारतीय बोलीभाषांचे संकलन, शब्दकोश निर्मिती, लोकसाहित्याचे शब्दांकन यातून भारताचे पूर्वापार संचित ग्रंथबद्ध झाले. भारतीय संस्कृतीत घडून आलेल्या चार क्रांत्यांची चार अध्यायांत सांगितलेली कहाणी म्हणजे दिनकरांचा ‘संस्कृति के चार अध्याय' ग्रंथराज. {{gap}}आधुनिक अशा भारतातील युरोपची पहिली पावले उठवली ती पोर्तुगीजांनी. प्राचीन काळात सिकंदराला भारताचे आकर्षण होते. तेच पंधराव्या शतकात कोलंबसलाही होतं. भारत शोधू पाहणारा कोलंबस अमेरिकेत पोहोचला पण युरोपियनांनी भारतात पाऊल ठेवलं ते वास्को डी गामाच्या रूपाने. तो २७/ २८ मे, १४९८ मध्ये कालिकत बंदरात उतरला व भारतात आधुनिकीकरणाची पहाट उगवली. सोळावे शतक हे पोर्तुगीजांच्या साम्राज्य व व्यापार विस्ताराचं. भारताच्या पश्चिम किनाच्यावर पोर्तुगीजांनी एके काळी अधिराज्य गाजवलं. ते विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजे गोवा मुक्ती संग्रामापर्यंत (१९६२) अबाधित होते. पोर्तुगीज भारतात सर्वांत आधी आले नि सर्वांत शेवटी गेले.{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/७१}}</noinclude> 4z6raiv9ol46dtp31r4r6owoml9cxvz पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/73 104 26102 233778 142356 2026-07-27T15:58:55Z कल्पनाशक्ती 3813 233778 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>{{gap}}सतराव्या शतकाच्या मध्यात डच आणि पोर्तुगीजांत तह झाला. तोपर्यंत डच भारतात होते. ते भारतात पोर्तुगीजांच्या दरम्यानच आले होते. साम्राज्यापेक्षा व्यापारात त्यांना अधिक रस होता. गोवा, दीव, दमण हेच त्याचे कार्यक्षेत्र राहिले. जावा, सुमात्रा, बोर्निओ ही बेटे त्यांच्या अंमलाखाली होती. पुढे ते इंडोनेशिया, मलेशियाकडे गेले. {{gap}}पोर्तुगीजांच्या भारत आगमनाने भारतीय जीवनावर दीर्घजीवी परिणाम झाले ते प्रामुख्याने पेयपान, फलाहार, मुद्रण, व्यापार, धर्मांतर इत्यादी रूपात. अननस, पपई, पेरू, हापूस ही भारताला मिळालेली पोर्तुगीजांची देणगी होय. अशी अनंक तथ्ये दिनकरांनी ‘संस्कृति के चार अध्याय'मध्ये नमूद करून ठेवली आहेत.<br> {{gap}}डचांनंतर फ्रेंच भारतात आले. पण त्यांचा फारसा प्रभाव भारतीय संस्कृतीवर पडला नाही. ते अठराव्या शतकाच्या मध्यात आले. डुप्लेने पाँडेचरीत फ्रेंचांचे राज्य स्थापन केले. (१७४१) या काळातली महत्त्वाची घटना म्हणजे म्हैसूर, हैद्राबाद संस्थानांत टिपू सुलतान व निजामाने उभारलेले स्वातंत्र्याचे झेंडे. हा फ्रेंच राज्यक्रांतीचा परिणाम होता. अशी सर्व साद्यंत माहिती नोंदवत दिनकरांनी युरोपाच्या भारतीय आगमन व सांस्कृतिक परिणाम प्रभावांच्या नोंदी करत भारताचा सांस्कृतिक कायापालट कोणत्या पार्श्वभूमीवर झाला ते स्पष्ट केले आहे. {{gap}}पहिला इंग्रज भारतात आला. तो म्हणजे स्टीफन. सन १५७९ मध्ये तो ख्रिश्चन मिशनरी म्हणून धर्मप्रसारार्थ भारतात आला, पण भारतात इंग्रज आगमनाची प्रभावी नोंद होते ती १६६१ मध्ये. गुजरातचा सुभेदार असलेल्या बहादूरशहाशी हुमायूचे युद्ध झाले. या युद्धात पोर्तुगीजांनी बहादुरशहाला मदत केली. उतराई म्हणून त्यांना मुंबई व वसई बेट दिले गेले होते. पोर्तुगीजांनी ती बेटे इंग्लंडच्या राजास हुंडा म्हणून भेट दिली. १६७९ मध्ये औरंगजेबाने हुगळी नदी (बंगाल) मध्ये जहाजे चालवायला इंग्रजांना परवाना दिला. त्यातून ईस्ट इंडिया कंपनीच्या भारत साम्राज्य विस्ताराची मुहर्तमेढ रोवली गेली. सन १८५७ पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या पहिल्या संग्रामापर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचा अंमल राहील. त्यानंतरही इंग्रज शतकभर भारतात राज्य करत राहिले. भारत स्वतंत्र होईपर्यंतचा सांस्कृतिक इतिहास दिनकरांनी या ग्रंथास शब्दबद्ध केल आहे. {{gap}}इंग्रजांच्या भारतातील अंमलाचा सर्वाधिक मोठा परिणाम येथील शिक्षणावर झाला. त्यातून सुधारित जग भारतास कळले. भारतात समाज सुधारकांची फळी तयार झाली. इंग्रजी भाषेचा प्रचार, प्रसार झाला. एतद्देशीय माध्यमांच्या<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/७२}}</noinclude> ld8uudk40siuwff5kkbojwd9307spig पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/74 104 26103 233779 142357 2026-07-27T16:00:15Z कल्पनाशक्ती 3813 233779 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" /></noinclude>शाळांचे जाळे देशात विकसित झाले. स्त्री शिक्षणाची पहाट झाली. इंग्रजी साहित्य संपर्कामुळे देशी साहित्याच्या कक्षा रुंदावल्या. कला, शिल्प, वास्तू सर्वच क्षेत्रात युरोपचा वरचष्मा राहिला. ख्रिश्चन धर्मातर गरीब वर्गात घडून जातिभेद कमी होण्यास, अस्पृश्यता निवारणास साहाय्य झाले ही दिनकरांने ग्रंथातील निरीक्षणे योग्यच म्हणायला हवीत. देशात प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज, महाराष्ट्र समाज, सत्यशोधक समाज, थिऑसॉफिकल सोसायटी, आर्यसमाज स्थापन होऊन भारतीय समाजाच्या नवोत्थानाची चळवळ सुरू झाली. यातून सती प्रथा बंदी, बालविवाह बंदी, केशवपन प्रथा विरोध, परित्यक्ता विवाह अशा अनेक सुधारणा समाजात घडून आल्या. या सर्वांचा संक्षिप्त आढावा दिनकरांनी चर्चित ग्रंथात घेतला आहे. रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, राजाराम मोहन रॉय, लोकमान्य टिळक, महायोगी अरविंद, महात्मा गांधी, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचे संस्कृती व राष्ट्र विकासाचे कार्य चौथ्या अध्यायात नमूद करून दिनकरांनी महाराष्ट्र, बंगाल व दक्षिण भारतातील सुधारणावादी विचारधारांबद्दलचा आपला आदर व अभ्यास एकाच वेळी सिद्ध केला. या काळात सर्वच धर्मात निर्माण झालेल्या जागृती व नवविचारांची दखल ग्रंथात घेण्यात आली आहे. कवी महंमद इकबाल, रवींद्रनाथ टागोरांच्या राष्ट्रवादी कार्याचीही विशेषवाने प्रशंसा दिनकरांनी केली आहे. ती राष्ट्रीय, राष्ट्रीयतेच्या म्हणजेच सामाजिक संस्कृती निर्मितीच्या अनुषंगाने ज्या मुस्लीम विचारक साहित्यिक व नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन हिंदुस्थान अखंड ठेवण्यात ज्यांचे योगदान आहे. अशा सर्व जाती, धर्म, प्रांत, भाषा, साहित्य, समाजाची नोंद घेत दिनकरांनी ‘संस्कृति के चार अध्याय' हा आपला ग्रंथ सर्वग्राही व सर्वसमावेशक कसा होईल, याची घेतलेली काळजी म्हणजे देशाप्रती लेखकाच्या असलेल्या बांधिलकी व जबाबदारीच्या भावनेचे संवेदनशील प्रगटीकरणच होय. {{gap}}या ग्रंथात देश विभाजनाचे शल्य दिनकरांनी नमूद केले आहे. भारताचे विभाजन वा फाळणी एका अर्थाने धार्मिक विभाजनच ठरले तरी विभाजनानंतरही दोन्ही देशात हिंदू-मुस्लीम राहिले. फाळणीनंतरच्या दंग्यात अनेक हिंदू, सिंधी, पंजाबी, काश्मिरी भारतात आले. मूळचे तर होतंच, पण त्यांच्यासह एकात्म भारत उभा करणे हे देशापुढचे आव्हान दिनकरांनी ‘उपसंहार' मध्ये थोड्याशा चिंतातुर स्वरात व्यक्त केले आहे. त्यासाठी देशाच्या भीषण सांस्कृतिक वास्तवाची दिनकरांना असलेली जाण आणि जाणीवच प्रतिबिंबित झाली आहे. प्रांतीयता, जातिभेद, पक्षांधता, केंद्रीय सत्तेविरुद्धची नाराजी इत्यादीसारखे १९५६ साली नोंदवलेले संभाव्य धोके<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/७३}}</noinclude> jv3kspc1vx5c3k4gwqnn3v6ttob71j5 पान:साहित्य आणि संस्कृती (Sahitya ani sanskurti).pdf/75 104 26104 233780 205014 2026-07-27T16:01:02Z कल्पनाशक्ती 3813 233780 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="Komal Sambhudas" /></noinclude>आज सत्यात उतरलेले आपण आज हे पुस्तक वाचताना अनुभवतो. तेव्हा दिनकराच्या द्रष्टेपणाची प्रचिती आल्याशिवाय राहात नाही.<br> {{gap}}स्वातंत्र्योत्तर भारताच्या प्रश्नांबाबत दिनकरांनी आपल्या ‘उपसंहार' मध्ये गंभीरपणे विचार केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतीयांपेक्षा विदेशी लेखकच या देशाच्या प्रश्नांचा तटस्थ विचार करू शकतील. दिनकरांचे हे पुस्तक शेवटी प्रत्येक भारतीयास अंतर्मुख करणारे ठरते. “हम भारतीयों में से हर एक भारत को एक रखना चाहता है। गलत काम हम जरूर करते है, लेकिन, गलतियाँ करने के बाद हमें शर्म भी होती है। हम पश्चात्ताप भी करते है । पता नहीं, आगे चलकर विजय पश्चात्ताप की होगी अथवा उन संकीर्ण भावनाओं की, जो हमसे देश का अहित करवाती है।" (पृ.५२८) ही चिंता दिनकरांनी व्यक्त केल्यानंतर सुमारे सहा दशकांचा काळ सरून मागे पडला. लक्षात काय येते, तर आपल्या संकुचित भावनांचाच प्रभाव व प्राबल्य वर्तमानात दिसते. पश्चात्तापाचा पराभव झाला असे घडले नाही, ही या देशाची वर्तमान शोकांतिक आहे. 'संस्कृति के चार अध्याय' सारखे पुस्तक वर्तमानात 'गीता' नि ‘संविधान' म्हणून वाचक वाचतील. हे पुस्तक वर्तमानाचे ‘बायबल' ‘कुराण’ ‘गुरू ग्रंथसाहेब' बनेल. तरी कदाचित उद्याचा भारत जात-धर्म मुक्त, प्रगल्भ लोकशाहीचे निधर्मी, विज्ञानवादी, अंधश्रद्धामुक्त आधिभौतिक सामासिक समन्वित संस्कृतीचे राष्ट्र बनेल. ते दिनकरांचे स्वप्न होते. या ग्रंथाची नजीकच्या काळात (२०१६) 'हीरक जयंती' साजरी होईल. तेव्हा हा ग्रंथ भारताच्या सर्व भाषेत नेण्याचा कार्यक्रम साहित्य अकादमी, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया, भारतीय ज्ञानपीठाने हाती घ्यायला हवा. या कामी भारत सरकारने पुढाकार घ्यावा. वर्तमान पंतप्रधान नुकतेच दिनकर लेखन सुवर्ण जयंती समारंभात म्हणाले होते की, 'जात, धर्माच्या जोखडातून भारत मुक्त करायला दिनकरांच्या साहित्याशिवाय दुसरा पर्याय नाही.' ते जर खरं असेल तर हा ग्रंथ प्रत्येक भारतीयांच्या घरी पोहोचला पाहिजे. या ग्रंथातील विचारांना राष्ट्रीय मान्यता व पाठबळ मिळेल तर उद्याचा भारत दिनकरांना अभिप्रेत सामासिक समन्वित संस्कृती संवाहक राष्ट्र बनेल. {{rule}} {{right|'''• संस्कृति के चार अध्याय -''' रामधारी सिंह 'दिनकर' }} {{right|लोकभारती प्रकाशन, पहली मंजिल, दरबारी बिल्डिंग,}} {{right|महात्मा गांधी मार्ग, इलाहाबाद (उ. प्र.)}} {{right|प्रकाशन - १९५६ पृष्ठे ५३२ मूल्य रु.३00/}} {{right|■ ■}}{{nop}}<noinclude>{{center|साहित्य आणि संस्कृती/७४}}</noinclude> im7mzyygs6fgwqd3jycawagolxgdjht प्रेरक चरित्रे 0 26602 233749 45062 2026-07-27T12:17:12Z QueerEcofeminist 918 "[[प्रेरक चरित्रे]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 45062 wikitext text/x-wiki <pages index="प्रेरक चरित्रे (Prerak Charitre).pdf" from=1 to=35/> sc034kof6qaqeu9kstpw3l2w606grxy शून्य कचरा 0 26604 233754 152967 2026-07-27T12:20:43Z QueerEcofeminist 918 "[[शून्य कचरा]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 152967 wikitext text/x-wiki <pages index="शून्य कचरा (Shoonya Kachara).pdf" from=1 to=60/> [[वर्ग:पर्यावरण]] mh2a4d8cbaom7yi78u3yq6ucgwp4y3r संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण 0 29109 233753 172411 2026-07-27T12:20:18Z QueerEcofeminist 918 "[[संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 172411 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण | साहित्यिक = लक्ष्मीकांत देशमुख | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = [[संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण/प्रास्ताविक|प्रास्ताविक]] | वर्ष = २०१८ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf" from=1 to=56 /> [[वर्ग:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण]] t4z58m9yq0tmnpaoxrxiye401zy39ll केल्याने होत आहे रे 0 34045 233751 126276 2026-07-27T12:18:51Z QueerEcofeminist 918 "[[केल्याने होत आहे रे]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 126276 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = केल्याने होत आहे रे | साहित्यिक = सुवर्णा गोखले, बागेश्री पोंक्षे | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = २००४ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf" from=1 to=1/> {{page break|label=}} <pages index="केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf" from=2 to=2/> {{page break|label=}} <pages index="केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf" from=3 to=3/> {{page break|label=}} <pages index="केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf" from=4 to=4/> {{page break|label=}} <pages index="केल्याने होत आहे रे (Kelyane Hot Ahe Re).pdf" from=5 to=5/> {{page break|label=}} p8ox59cmuzlybaxri1y13gocgt3fiwy कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा 0 38307 233755 217725 2026-07-27T12:21:15Z QueerEcofeminist 918 "[[कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा]]" ची ने संरक्षण पातळी बदलली ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत)) 217725 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा | साहित्यिक = हमीद दलवाई | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = [[कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा/महाराष्ट्रीय मुसलमान|महाराष्ट्रीय मुसलमान]] | वर्ष = 2017 | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा.pdf" from=1 to=5/> [[वर्ग:कानोसा भारतातील मुस्लिम मनाचा]] 5590mc2arfrokuxgiktbm6zhzdympt5 वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा 0 101014 233750 204955 2026-07-27T12:18:02Z QueerEcofeminist 918 "[[वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 204955 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा | साहित्यिक = नरहर कुरूंदकर | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="वर्ण-वर्ग निराकरणाचा लढा (Warn-Warg Nirakaranacha Ladha).pdf" from=1 to=42 /> itsvjr2xs51tl9vkz5e8wfxxijlu195 अनुक्रमणिका:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf 106 104076 233762 233717 2026-07-27T12:31:25Z कल्पनाशक्ती 3813 233762 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=समाजशास्त्रावरील व्याख्याने |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=नटेश अप्पाजी द्रविड |Address=पुणे |Year=1914 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 6="समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व" 28="समाजशास्त्रांतील कांहीं प्रमेयें." 50="आजकालच्या समाजशास्त्रज्ञांचीं मतें" 70="हिंदु समाजव्यवस्थेच्या मूलभूत कल्पना" 90="आमच्या वैवाहिक चाली व स्त्रियांचा सामाजिक दर्जा"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] lqy450v88jng2p8jg1u32dgtts0velk 233805 233762 2026-07-28T09:46:03Z कल्पनाशक्ती 3813 233805 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=समाजशास्त्रावरील व्याख्याने |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=नटेश अप्पाजी द्रविड |Address=पुणे |Year=1914 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 6="समाजशास्त्राचा अभ्यास आणि त्याचं महत्व" 28="समाजशास्त्रांतील कांहीं प्रमेयें." 50="आजकालच्या समाजशास्त्रज्ञांचीं मतें" 70="हिंदु समाजव्यवस्थेच्या मूलभूत कल्पना" 90="आमच्या वैवाहिक चाली व स्त्रियांचा सामाजिक दर्जा" 110 ="जातिभेद व वर्णभेद"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] akwusau7xxip8m2h3u05epuwji6kn3z लोकसहभागातून पाणलोटक्षेत्र विकास 0 106835 233744 217772 2026-07-27T12:10:33Z QueerEcofeminist 918 "[[लोकसहभागातून पाणलोटक्षेत्र विकास]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 217772 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = लोकसहभागातून पाणलोटक्षेत्र विकास | साहित्यिक = संध्या एदलाबादकर | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = 2001 | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="लोकसहभागातून पाणलोटक्षेत्र विकास.pdf" from=1 to=19/> fyp38cnlgaapgeypdkrcqarf053m8h8 श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ 0 109561 233748 226967 2026-07-27T12:15:11Z QueerEcofeminist 918 "[[श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ]]" ला ने संरक्षित केले ([संपादन=Allow only template editors and administrators] (अनंत) [स्थानांतरण=Allow only template editors and administrators] (अनंत)) 226967 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ | साहित्यिक = वसंतराव देशपांडे | अनुवादक = | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = १९८६ | टिपण = | वर्ग = | दालन = }} <pages index="श्री गुरुदेव रानडे - निंबरगी स्वरूप सांप्रदायाचा दीपस्तंभ.pdf" from=1 to=25 /> 8z342ff9qgh4gxsd92ysh56j03b6jje पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/६० 104 111124 233815 233658 2026-07-28T10:17:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233815 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(५५)}}</noinclude>जुन्या लोकांचे मत विभूतीच्या बाजूला जास्त हेलकावलें होतें तर उत्क्रांतिवाद्यांचे मत परिस्थितीच्या बाजूला जास्त झुकले होते. पण अर्वाचीन समाजशास्त्रांज्ञांनी लंबकाचा गोळा मधोमध आणून ठेविला. त्यांनी परिस्थिति व विभूति अशी समाजांत फरक घडवून आणणारी दोन कारणें मानिली आहेत. हीं कारणें परस्परविरोधी नाहीत; परस्परांस पोषक आहेत, असें त्यांनी दाखविले आहे. निवळ परिस्थितीनेहीं कांहीं कार्य होणार नाहीं. किंवा निवळ विभूतींनींही कांहीं कार्य होणार नाहीं. त्या विभूतींना परिस्थिति अनुकूल असेल तरच त्यांचे हातून कार्य होईल. पण परिस्थिति ही नशीबासारखी पंगू आहे; आणि विभूतिही पुरुषत्वाप्रमाणे स्वयंप्रवर्तकच आहे, येवढा या दोन कारणांमध्ये फरक आहे व म्हणूनच विभूतींना थोडे जास्त महत्व दिले पाहिजे. असे अर्वाचीन मत आहे. समाजांत फरक घडवून आणणाऱ्या या विभूती दोन प्रकारच्या असतात. काही कार्यकारी असतात तर कांहीं कल्पनाकारी असतात. कांहीं विभूतींमध्ये विलक्षण कर्तबगारी व सामर्थ्य असते; व त्यायोगाने त्या प्रत्यक्ष कृतीनें समाजांत फरक घडवून आणतात. मोठेमोठे योद्धे, राजकार्यधुरंधर, धर्मप्रवर्तक धाडशी व्यापारी वगैरे विभूती कार्यकारी वर्गापैकी आहेत. सीझर, ॲलेक्झेंडर लूथर, नेपोलियन, शिवाजी, शंकराचार्य, महंमद, बुद्ध, वगैरे या वर्गापैकी उदाहरणे होत. दुसऱ्या वर्गाच्या विभूति नव्या कल्पनांनी आणि नव्या ललित कलाविषयक कृतींनी समाजांमधील लोकांमध्ये जागृति करून समाजांत क्रांति घडवून आणतात. मोठमोठे वक्ते, प्रतिभासंपन्न कवि, नामांकित चित्रकार, शोधक, शास्त्राज्ञ, तत्त्वज्ञानी वगैरे विभूती कल्पनाकारी वर्गापैकीं आहेत. या दोनही प्रकारच्या विभूतींचा समाजावर अखेर परिणाम सारखाच होतो. समाजांतील पूर्वस्थितींत बदल घडवून आणणे, हाच तो परिणाम होय. पण कार्यकारी विभूती प्रत्यक्ष कृतीनें व कल्पनाकारी विभूति आपल्या नव्या कल्पनांनी हे बदल घडवून आणतात इतकेंच.{{nop}}<noinclude></noinclude> rxv60l92g93x2jxj3yydu3e26hqxsdu पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७८ 104 111157 233738 2026-07-27T11:59:26Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233738 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७३)}}</noinclude>मुळ आमच्या समाजाचा एक पाया, याच दृष्टीने फक्त आज मी त्याबद्दल बोलतो.<br>{{gap}}आम्हांमध्ये कांहीं धार्मिक विधि, कांहीं पौराणिक कथा आणि कांहीं चालीरीति सर्वसाधारण असल्यामुळे इतर समाजांप्रमाणेच आमचा हिंदुसमाजही एकजीव समान आहे असे आम्हीं म्हणतों- पण आमच्या समाजाची रचना इतर समाजांच्या रचनेपेक्षां फारच निराळ्या अशा तत्त्वावर झालेली आहे. मी ह्या व्याख्यानाच्या अरंभी सांगितलेल्या गोष्टींवरून दिसून येणारी आमची कृत्रिम शुचिर्भूतपणाची अथवा सोवळ्याओवळ्याची कल्पना आणि आतांच सांगितलेली मनुष्यामनुष्यांतील जन्मजात विषमतेची अथवा जातीची कल्पना इतर कोणत्याही समाजांत नसल्यामुळे त्यांतील लोकांना आमची ही अनन्यसामान्य तत्त्वांवर झालेली समाजरचना पाहून मोठे आश्चर्य वाटते, असें परदेशी प्रवाशांनी इकडे येऊन आणि आमच्या समाजाचें बारकाईनें निरीक्षण करून लिहिलेल्या हकीकतीवरून उघड दिसतें.<br>{{gap}}आपणामध्ये रूढ असलेल्या जातिभेदाचें स्वरूप कसें आहे, आपणां सर्वास चांगले माहीत असल्यामुळे त्याबद्दल विशेष माहिती देण्याची अवश्यकता दिसत नाहीं. आपल्या समाजांतील कोणीही मनुष्य ज्या जातीत जन्मला असेल त्या जातीप्रमाणे त्याचा समाजांतील दर्जा आणि त्याची सामाजिक योग्यता त्याच्या जन्माबरोबरच कशी ठरते, हे आपणांस विदित आहेच. एखादा मनुष्य ब्राह्मणजातीत जन्मास आला म्हणजे साहजिक त्याच्या जन्माबरोबरच त्याला खालच्या जातींत जन्मलेल्या माणसांपेक्षां समाजांत विशेष हक्क, विशेष सवलती आणि विशेष योग्यता प्राप्त होते. अशा रीतीनें मनुष्याची योग्यता त्याच्या अंगच्या गणा-<noinclude></noinclude> j8xbmzup4v954348nyeuwa09mo19qgu पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/७९ 104 111158 233739 2026-07-27T12:01:53Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233739 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७४)}}</noinclude>वरून अथवा कर्तबगारीवरून न ठरवितां केवळ विशिष्ट जातींत जन्म पावल्यावरूनच ठरविण्यांत येते.<br>{{gap}}माणसामाणसांत भिन्नता असणें साहजिक असून तशा प्रकारची भिन्नता जगांतील सर्वं समाजांत आढळून येते. तिकडील समाजरचना कशी असते हे आपण आतां पाहूं. उदाहरणार्थ, फ्रेंच समाज घ्या अथवा आपल्या विशेष परिचयाचा असा इंग्रज समाज घ्या. इंग्रजी समाजाचा इतिहास पाहूं गेलें असतां हा समाज सॅक्सन- सेल्ट, नॉर्मन, स्कॉटिश वगैरे निरनिराळ्या लोकांचे मिश्रण होऊन झालेला आहे. ह्या समाजाच्या वाढीचा इतिहास कसाही असो पण आतां ग्रेटब्रिटन देशांत जो जन्मला अगर जो जो तेथलां कायमचा रहिवाशी झाला त्याला झाला त्याला त्या समाजाचा घटक मानण्यांत येते. तिकडील समाजांत श्रीमान्, मध्यम आणि सामान्य असे लोकांचे तीन भेद मानण्यांत येतात. हे भेद फक्त इंग्रज समाजांतच आहेत असें नाही. जगांतील सर्व समाजांत त्यांचे अस्तित्व आहे. श्रीमान् लोकांचा दर्जा समाजामध्ये अगदीं उच्च प्रतीचा समजतात. मध्यम लोकांची पायरी यांच्या खालची आणि सामान्य लोकांची शेवटची असे मानतात. निरनिराळ्या सांपत्तिक स्थितींतील ह्या लोकांचा समाजांतील दर्जा, जसा निरनिराळा असतो तशाच त्यांच्या कल्पनाही निरनिराळ्या असतात. पण हे भेद आमच्याप्रमाणे अंगदीं वज्रलेप नाहींत. त्यांच्या मर्यादा कोणालाही सहज ओलांडतां येतात. सामान्यतः कायद्याच्या दृष्टीनें इंग्लंडांतील सर्व लोक सारखे मानले आहेत. त्यांना सारखे अधिकार आणि सारखेच हक्क आहेत. यामुळे तिकडील सर्व माणसांना आपली स्थिति सुधारण्याला सारखीच सवलत मिळते. मनुष्य कोणत्याही वर्णात जन्मलेला असो; त्यानें हवें तें शिकावें; हवें तेथें शिकावे; हव्या त्या सार्वजनिक वाहनांतून प्रवास करावा; तसे कर-<noinclude></noinclude> rtovumo4jr2lyvrmo3gqsnrq5ppg9dj पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८० 104 111159 233740 2026-07-27T12:04:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233740 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७५)}}</noinclude>ण्यास कोणालाही जन्माची अथवा सामाजिक स्थितीची आडकाठी तिकडे नाहीं. हें वर्गीकरण इतके लवचीक असतें कीं, सामान्य वर्गांतील मनुष्याच्या अंगांत जर धमक असेल आणि जर तो प्रयत्न करील तर त्याला मध्यम अथवा श्रीमान् लोकांच्या वर्गांतही जातां येईल. आमचा जातिभेद वज्रलेप असतो; आणि म्हणूनच आम्हांपैकी कोणाही मनुष्याचा सामाजिक दर्जाही पण वज्रलेपच असतो. शूद्र वर्णांत जन्मलेला कोणीही मनुष्य द्रव्य संपादन करून मोठा श्रीमान् झाला अथवा सांप्रत थोडीबहुत साधने असल्यामुळे विद्या शिकून मोठा विद्वान् झाला तरी जन्मामुळे समाजामध्ये जी त्याची शेवटची पायरी ठरलेली आहे ती केव्हांही बदलत नाहीं. आमच्या समाजांत ह्या जातिभेदामुळे हजारों पोट-समाज बनले आहेत. त्याचा तूर्त विचार न करतां प्राचीन काळचे चारच वर्ण विचारात घेतले तरी आपल्या प्रयत्नाने श्रीमान् आणि विद्वान् झालेल्या पण शुद्र वर्णात जन्मलेल्या माणसाला वैश्य वर्णांतही जातां येत नाहीं. असें कां व्हावें? जन्मजात शूद्राच्या अंगांत जर सामर्थ्य असेल तर त्याला वरच्या वर्णांत कां जातां येऊ नये? जन्मावर ठरविलेली माणसामाणसामधली ही कृत्रिम विषमताच याचे कारण आहे. ग्रीक तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल म्हणे कीं, "ईश्वरानें बुद्धिमत्ता, सामर्थ्य, उत्तम भाषा, आत्मनिग्रह, दुसऱ्यांना ताब्यांत ठेवण्याची योग्यता, उत्तमप्रकारची सदसद्विवेकबुद्धि, वगैरे अनेक सद्गुण ग्रीक लोकांना दिले आहेत. इतर रानटी लोकांना त्यानें हे गुण दिले नाहींत म्हणून त्यांनी ग्रीक लोकांची गुलामगिरी पतकरली पाहिजे, अशी ईश्वराची इच्छाच दिसते; तेव्हां रानटी लोकांनी मुळींच कुरकुर न करितां ती मान्य केली पाहिजे गुलामगिरी ही ईश्वरनिर्मित संस्था आहे." ॲरिस्टॉट्ल गुलामगिरी संबंधानें जें म्हणतो तेच आमचे धर्मशास्त्रकार जातिभेदासंबंधानें<noinclude></noinclude> p2nkafon9m5v4h4ekd38flw65wrb2rz पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८१ 104 111160 233741 2026-07-27T12:06:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233741 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७६)}}</noinclude>म्हणतात. कित्येक लोक कर्म आणि पुनर्जन्म यांच्या जोरावर जातिभेदाचें समर्थन करितात. ज्या मनुष्याने पूर्वजन्मीं कांहीं वाईट आचरण केलें असेल त्यालाच ह्या जन्मीं खालच्या जातींत जन्म घ्यावा लागतो; असे असल्यामुळे मनुष्यामनुष्यांतील ही जन्मजात विषमता अगदीं स्वाभाविक असून केवळ अपरिहार्य आहे; असे ते म्हणतात. एकंदरीत ह्या कृत्रिम विषमभावाची पाळेमुळे आमच्या समाजांत किती खोल गेलेली आहेत हे यावरून आपणांस समजेल. ही विषमता मनुष्याच्या अंगच्या गुणांवर अवलंबून नसल्यामुळें मी हिला 'कृत्रिम' असें म्हटलें आहे. एकाच जातीच्या दोन माणसांत ज्याच्या अंगी योग्यता, बुद्धिमत्ता, कर्तृत्व अभिरुचि वगैरे विशेष गुण असतील त्याला आपण दुसऱ्यापेक्षां श्रेष्ठ मानतों, ही स्वाभाविक विषमता झाली. येथे आपण मनुष्याची योग्यता त्याच्या अंगच्या गुणांवर ठरवितों; जातीवर ठरवीत नाहीं. जन्मावर ठरणारा श्रेष्ठकनिष्ठभाव व्याख्यानाच्या आरंभीं सांगितलेल्या कृत्रिम शुचिर्भूतपणाप्रमाणेच केवळ कृत्रिम आहे. विशेष जातींत जन्मलेला मनुष्य विशेष गुणांनी मंडित असतोच असें मानण अगदी चुकीचें आहे. असो अशा रीतीचा मनुष्यामनुष्यांतील हा कृत्रिम भेदभाव, ही आमच्या समाजव्यवस्थेची तिसरी मूलभूत कल्पना आहे.<br>{{gap}}आमच्या समाजव्यवस्थेच्या मुळाशी असलेलें चौथें तत्त्व, म्हणजे आमच्या हाडीमासीं खिळलेला मायावाद हे होय. हें सर्व जग मिथ्या असून, संसार दुःखमय आहे; जें जें आपणास दिसतें तें तें सर्व मिथ्या असून दिसणे हा केवळ भास आहे, त्यांत खरेंपणा मुळींच नाहीं; ह्या सर्वांचा शेवट दुःखांतच होणार, असें मायावाद आपणांस सांगतो. असा प्रकार असल्यामुळें मुक्ति मिळविणें- चिरकालीन सुख संपादणे- हेंच आपले इतिकर्तव्य मान-<noinclude></noinclude> 4vs6ult90l9idy1z0xfamo3is9jr5l8 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८२ 104 111161 233742 2026-07-27T12:09:09Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233742 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७७)}}</noinclude>ण्यांत येते. मुक्ति किंवा चिरकालीन सुख मिळवावयाचें म्हणजे तें ह्या जगांत राहून किंवा ह्या जगांतील आपले कर्तव्य करून मिळवावयाचें असें नाहीं तर ह्या दुःखमय आणि केवळ मृगजळाप्रमाणे भासणाऱ्या जगाकडे मुळींच न पाहतां आपलें धार्मिक कर्तव्य करून मिळवावयाचें. दुर्गुण, संकटें आणि दुःख हीं जगांत असावयाचीच; त्यांची आणि संसाराची देवानें घालून दिलेली सांगड कधींच सुटावयाची नाही म्हणून जगांतील ह्या गोष्टीकडे मुळींच न बघतां आपलें पारमार्थिक कर्तव्य करा म्हणजे तुम्ही मुक्त व्हाल, असें ह्या मायावादाचें आपणांस सांगणें आहे. आपले ऐहिक कर्तव्य नेहमीं पारलौकिक सुखाकरितां असले पाहिजे. ऐहिक सुख मिथ्या आहे म्हणून त्याकरितां आपणांस कांहींच करावयास नको. हे मायावादाचे तत्त्व आमच्या हाडींमाशी इतकें भिनलेले आहे कीं, आम्हाला नकळत ते आमच्या नेहमींच्या संभाषणांत, आमच्या विचारांत व आमच्या आचारांत दिसून येतें. दुसऱ्या देशांतील लोक ऐहिक सुखाच्या मागे लागलेले दिसतात आणि परलोकाची कल्पना जरी त्यांना असली तरी त्या लोकाकडे ते विशेष लक्ष देत नाहींत. त्यांचें सर्व लक्ष इहलोकच्या गोष्टींत गुंतलेलें असतें. आमची स्थिति ह्याच्या अगदी उलट आहे; आणि म्हणूनच आमच्यांत दैववादाचे मोठे बंड आहे. आम्हीं म्हणतों नशिबीं असेल त्या स्थितींत आम्हीं रहाणार, मग ती सुधारण्याचा व्यर्थ प्रयत्न हवा कशाला? आम्हीं ज्या स्थितींत आहों ती स्थिति आम्हांला आमच्या पूर्वसंचिताप्रमाणें मिळालेली आहे; ती भोगल्यावांचून आमची सुटकाच नाहीं. ह्या दैववादामुळे आमच्या वृत्तींत जो एक प्रकारचा संतोष दिसून येतो, तो इतर राष्ट्रांतील लोकांत मुळींच आढळत नाहीं. ही आमची समाधानवृत्ति कांहीं बाबतीत खरोखरच फार चांगली आहे. दुःख आणि संकटे सोसण्याचे आपल्या अंगीं जें सामर्थ्य<noinclude></noinclude> o55dohul5ma4qei2e5ue1d5cocoar00 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६ 104 111162 233743 2026-07-27T12:10:32Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "अनुक्रमणिका. .... .... .... लेखांक १. प्रास्ताविक .... .... व्यासंग ऐतिहासिक त अलंकारशास्त्र वाङ्मयांतील निर्णय .... .... तीन कोटी .... पृष्ठांक १ - १४ १ - ३ ३-५ ५–८ .... .... .... .... ८–११ .... .... ११–१२ .... .... १२–१३ ऐतिहास..." 233743 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>अनुक्रमणिका. .... .... .... लेखांक १. प्रास्ताविक .... .... व्यासंग ऐतिहासिक त अलंकारशास्त्र वाङ्मयांतील निर्णय .... .... तीन कोटी .... पृष्ठांक १ - १४ १ - ३ ३-५ ५–८ .... .... .... .... ८–११ .... .... ११–१२ .... .... १२–१३ ऐतिहासिक पद्धतीचे गुणदोष लेखांक २. .... .... ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धती. ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग - उदाहरणें ओंवी व अभंग. पोवाडा, व लावणी वगैरे. तुलनात्मक पद्धती. .... १३ – १४ .... १५---२५ .... १५ – १६ १६ – १९ .... १८–१९ .... २०-२२ २२–२५ .... .... लेखांक ३. .... .... .... २६--४० .... .... २६–२८ पद्य व गद्य.... कांही ठराविक प्रकार .... .... २८ .... २९-३० .... अगत्याची सूचना. तुलनात्मक पद्धतीची उदाहरणें- चरित्र ( Biography ) ३०-३५<noinclude></noinclude> f5rngofz3egz5qwuwsm6wmb5g7jc6fo 233746 233743 2026-07-27T12:13:02Z JayashreeVI 4058 233746 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{x-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}} .... .... .... लेखांक १. प्रास्ताविक .... .... व्यासंग ऐतिहासिक त अलंकारशास्त्र वाङ्मयांतील निर्णय .... .... तीन कोटी .... पृष्ठांक १ - १४ १ - ३ ३-५ ५–८ .... .... .... .... ८–११ .... .... ११–१२ .... .... १२–१३ ऐतिहासिक पद्धतीचे गुणदोष लेखांक २. .... .... ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धती. ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग - उदाहरणें ओंवी व अभंग. पोवाडा, व लावणी वगैरे. तुलनात्मक पद्धती. .... १३ – १४ .... १५---२५ .... १५ – १६ १६ – १९ .... १८–१९ .... २०-२२ २२–२५ .... .... लेखांक ३. .... .... .... २६--४० .... .... २६–२८ पद्य व गद्य.... कांही ठराविक प्रकार .... .... २८ .... २९-३० .... अगत्याची सूचना. तुलनात्मक पद्धतीची उदाहरणें- चरित्र ( Biography ) ३०-३५<noinclude></noinclude> 16qv5fsf37wthlrqkn92s6w5fisywot 233763 233746 2026-07-27T12:38:56Z JayashreeVI 4058 233763 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{x-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}} .... .... .... <center> {| |+ |- |{{larger|'''लेखांक १.'''}} ||१ - १४ |- {{gap}}प्रास्ताविक || १ - ३ लेखांक १. प्रास्ताविक .... .... व्यासंग ऐतिहासिक त अलंकारशास्त्र वाङ्मयांतील निर्णय .... .... तीन कोटी .... पृष्ठांक १ - १४ १ - ३ ३-५ ५–८ .... .... .... .... ८–११ .... .... ११–१२ .... .... १२–१३ ऐतिहासिक पद्धतीचे गुणदोष लेखांक २. .... .... ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धती. ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग - उदाहरणें ओंवी व अभंग. पोवाडा, व लावणी वगैरे. तुलनात्मक पद्धती. .... १३ – १४ .... १५---२५ .... १५ – १६ १६ – १९ .... १८–१९ .... २०-२२ २२–२५ .... .... लेखांक ३. .... .... .... २६--४० .... .... २६–२८ पद्य व गद्य.... कांही ठराविक प्रकार .... .... २८ .... २९-३० .... अगत्याची सूचना. तुलनात्मक पद्धतीची उदाहरणें- चरित्र ( Biography ) ३०-३५<noinclude></noinclude> 0cvl3h50nctup60q28dbwp4nfd0i2jy 233781 233763 2026-07-28T05:04:14Z JayashreeVI 4058 233781 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{x-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}} .... .... <center> {| |+ |- |{{larger|'''लेखांक १.'''}} || || १ - १४ |- |{{gap}}प्रास्ताविक || || १ - ३ लेखांक १. प्रास्ताविक .... .... व्यासंग ऐतिहासिक त अलंकारशास्त्र वाङ्मयांतील निर्णय .... .... तीन कोटी .... पृष्ठांक १ - १४ १ - ३ ३-५ ५–८ .... .... .... .... ८–११ .... .... ११–१२ .... .... १२–१३ ऐतिहासिक पद्धतीचे गुणदोष लेखांक २. .... .... ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धती. ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग - उदाहरणें ओंवी व अभंग. पोवाडा, व लावणी वगैरे. तुलनात्मक पद्धती. .... १३ – १४ .... १५---२५ .... १५ – १६ १६ – १९ .... १८–१९ .... २०-२२ २२–२५ .... .... लेखांक ३. .... .... .... २६--४० .... .... २६–२८ पद्य व गद्य.... कांही ठराविक प्रकार .... .... २८ .... २९-३० .... अगत्याची सूचना. तुलनात्मक पद्धतीची उदाहरणें- चरित्र ( Biography ) ३०-३५<noinclude></noinclude> 4fqcqihu1nu75fsyoea7g0vuye2jn27 233785 233781 2026-07-28T05:49:49Z कल्पनाशक्ती 3813 233785 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|{{x-larger|'''अनुक्रमणिका.'''}}}} .... .... <center> {| |+ |- | || '''पृष्ठांक''' |- |'''लेखांक १.'''{{gap}}{{gap}}{{gap}} || १ - १४ |- |{{gap}}प्रास्ताविक || १ - ३ |- |{{gap}}व्यासंग || ३ - ५ |- |{{gap}}ऐतिहासिक रीत || ५ - ८ |} लेखांक १. प्रास्ताविक .... .... अलंकारशास्त्र वाङ्मयांतील निर्णय .... .... तीन कोटी .... पृष्ठांक १ - १४ १ - ३ ३-५ ५–८ .... .... .... .... ८–११ .... .... ११–१२ .... .... १२–१३ ऐतिहासिक पद्धतीचे गुणदोष लेखांक २. .... .... ऐतिहासिक व तुलनात्मक पद्धती. ऐतिहासिक पद्धतीचा उपयोग - उदाहरणें ओंवी व अभंग. पोवाडा, व लावणी वगैरे. तुलनात्मक पद्धती. .... १३ – १४ .... १५---२५ .... १५ – १६ १६ – १९ .... १८–१९ .... २०-२२ २२–२५ .... .... लेखांक ३. .... .... .... २६--४० .... .... २६–२८ पद्य व गद्य.... कांही ठराविक प्रकार .... .... २८ .... २९-३० .... अगत्याची सूचना. तुलनात्मक पद्धतीची उदाहरणें- चरित्र ( Biography ) ३०-३५<noinclude></noinclude> giqh0j5orayrww0wjnhng3qpetzfur4 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८३ 104 111163 233745 2026-07-27T12:11:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233745 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७८)}}</noinclude>आहे ते इतर देशांतील लोकांच्या आंगीं नाहीं. कितीही संकटें येवोत,हव्या त्या गैरसोयी होवोत अथवा कशीही दुःखे भोगावी लागोत, ह्या सर्व ऐहिक आपत्ती आपणावर आपल्या पूर्वसंचितामुळे आलेल्या असून अगदी अपरिहार्य आहेत. तसेंच आपले हे जीवितच जर केवळ माया आहे तर ह्या आपत्ती खऱ्या मानून विनाकारण यांच्याश झुंजत बसण्यांत तरी काय अर्थ आहे, असें आम्हीं मानतों; आणि आलेल्या आपत्ती, त्यांचा प्रतिकार न करितां, निमूटपणे सहन करतों. आम्हांमध्यें ऐहिक गोष्टीविषयीं एक प्रकारची विरक्ति, समाधानवृत्ति, सहनशीलता जी दिसून येते ती मायावाद आणि दैववाद यामुळेच दिसून येते. मायावाद आणि दैववाद यामुळे जरी हे सद्गुण आमच्यांत आले असले तरी जगाला मिथ्या पसारा मानणें आणि दैवावर भरवसा ठेवणें ह्या गोष्टीचे दुसरे पुष्कळ वाईट परिणामही आम्हांला भोगावे लागत आहेत. एक प्रकारें इतर देशांतील लोकांपेक्षां ऐहिक सुखाकरितां जास्त धडपड करणारे जे आमचे लोक दिसतात ते या असल्याच विचारांमुळे! आमच्या दृष्टीने जग जर खरोखरच मिथ्या असेल, तें जर केवळ मायेचा बाजार असेल तर असल्या जगांत राहून तरी काय करावयाचें आहे? आम्हीं जर आपले धार्मिक नियम बरोबर रीतीने पाळले, आम्ही आपली धार्मिक कृत्यें जर यथाविधि केली तर स्वर्ग आमच्याकरितां अगदीं राखूनच ठेवण्यांत आलेला असतो असें आम्हांला वाटतें. पण हीं धार्मिक कृत्ये म्हणजे तरी काय? धार्मिक ग्रंथकारांनी आम्हांस करावयास सांगितलेलीं जीं कृत्यें तीं धार्मिक कृत्यें. ह्या धार्मिक कृत्यांवांचून इतर गोष्टीकडे लक्ष देण्याचें कारण नाहीं अशी आम्हीं आपल्या मनाची समजूत करून घेतो. इतर बाबतींत आम्हीं हवें तसें वागतों. मायेच्या जगांत मनमानेल तसें वागण्यात काय हरकत आहे? असें अगदी जुन्या मताच्या हिंदु गृह-<noinclude></noinclude> t5ni4amh1txqlyzy4oz9zkyg9261lw0 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८४ 104 111164 233747 2026-07-27T12:14:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233747 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(७९)}}</noinclude>स्थास वाटत असतें आणि तो आपल्या सांसारिक फायद्याकरितां हवें तें करण्यास तयार होतो. अप्रामाणिकपणासारखें नितिदृष्ट्या अगदी निंद्य असे आचरण करितांना त्याच्या मनाला मुळींच दिक्कत वाटत नाहीं. तो असल्या गोष्टी अगदीं उजळ माथ्याने करीत असून आपणां स्वताःला मोठा धर्मनिष्ठ समजत असतो. असली धर्मनिष्ठ समजली जाणारी माणसें तुम्हांला आपल्या समाजांत अगदी पदोपदी आढळतील. तीं म्हणतात:- 'आम्ही आपली संध्यादि नित्यकर्मे आणि इतर धार्मिक विधी यथाशास्त्र करतो; तेव्हां अर्थातच मृत्यूनंतर आम्हांला स्वर्ग प्राप्त होणार.' माझ्या लहानपणाच्या आठवणींतली एक गोष्ट मी येथे सांगतो. माझे वडील वकील असून त्यांचा ओढा सुधारणापक्षाकडे होता. त्यांचे एक स्नेही आणि दूरचे नातेवाईक आमच्या येथेच कामाकरितां येत असत व आमच्या घरींच रहात असत. हे आमच्या वडिलांचे स्नेही आतांच सांगितलेल्या धार्मिक लोकांच्या वर्गांतले होते. त्यांची स्नानसंध्या कधीच टळली नाहीं. ते संध्येला बसले म्हणजे तासचे तास संध्या करीत बसत. मी त्या वेळी लहान होतों पण मला त्यांच्या संध्येचे चांगले स्मरण आहे. ते संध्येतील दोनचार नांवें तोंडानें म्हणत आणि मध्येच माझ्या वडिलांना "कायहो वकील, त्या राम्या पाटलाच्या कज्जाचे काय झालें?" असें विचारीत; आणि पुनः संध्या करूं लागत. पांचचार मिनिटें संध्येत गेलीं म्हणजे पुनः असाच दुसरा कांहीं प्रश्न माझ्या वडिलांना करीत. असली संध्या करून फायदा काय, असे जर माझ्या वडिलांनी त्यांना विचारले तर ते साफ सांगत की, मी संध्यावंदनादि आपलीं सर्व कृत्ये अगदी यथासांग पार पाडली आहेत तेव्हां अर्थातच मला मरणोत्तर उत्तमलोकप्राप्ति होणार. 'ह्या जगांत प्रामाणिकपणाने आणि नीतीनें न वागणाऱ्या माणसाला असली हीं धर्मकृत्यें स्वर्गप्राप्ति करून घेण्यास समर्थ आहेत काय?' असा प्रश्न कोणी केल्यास त्याला<noinclude></noinclude> 6zy83v0tgc4iybrv1co1oxzsf9bwjkk पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८५ 104 111165 233752 2026-07-27T12:19:59Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233752 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८०)}}</noinclude>हे धर्मात्मे "प्रामाणिकपणा आणि नीति वगैरे ह्या गोष्टी केवळ ऐहिक म्हणजे अर्थातच मिथ्या आहेत; परलोकांशी ह्या दुःखमय जगांतील गोष्टीचा संबंध काडीचाही नाहीं; असल्या गोष्टीकडे लक्ष देणे म्हणजे पारमार्थिक सुखाला आंचवणेच आहे." असा रोखठोक जबाब देणार. धार्मिक म्हणविणाऱ्या लोकांचें हें तत्त्वज्ञान अलीकडच्या विद्वानांना खरोखरच अश्रुतपूर्व आणि अगम्य वाटेल.<br>{{gap}}मागील व्याख्यानांच्याद्वारे समाजशास्त्रासंबंधानें आपणांस झालेल्या माहितीशी ह्याचा कसा संबंध आहे, हें आपण आतां पाहूं. माझ्या मतें आपल्या देशांत मामाजिक सुधारणेची फार अवश्यकता आहे; कारण आतांपर्यंत सांगितलेल्या मूलभूत कल्पनांच्या आधारावर आमच्या सामाजिक नियमांची रचना करण्यांत आली आहे. परंतु आमच्या सामाजिक नियमाच्या मुळाशी असलेल्या ह्या कल्पना, अशा प्रगतीला अनिष्ट असून समाजशास्त्राच्या ज्या तत्त्वांस अनुसरून आमची प्रगति होणें शक्य आहे, त्या तत्त्वांविरुद्ध आहेत. समाजशास्त्राच्या ज्या नियमांनी एखादा समाज बनतो, ज्या नियमांनीं तो सुव्यवस्थित राहतो, ज्या नियमानुसार त्याची प्रगति आणि वाढ होते त्या सर्व नियमांचा विचार मी आपल्या मागील व्याख्यानांतून केला असून, त्याच वेळीं समाज म्हणजे काय आणि समाजाचा व्यक्तीशी काय संबंध आहे, इत्यादि प्रश्नांबद्दल आधुनिक समाजशास्त्रज्ञांचे अभिप्राय सांगितले आहेत. व्यक्तीची सार्वत्रिक सुधारणा करणें हे समाजाचें ध्येय असल्यामुळे वैयक्तिक सुधारणेस अडथळा करण्यासारखे नियम समाजांत रूढ राहणें इष्ट नाहीं, असें समाजशास्त्रज्ञांचे मत आहे. आतां धर्माशास्त्रकारांनी समाजांतील व्यक्तीला मुलासारखें- कधींही प्रौढ न होणाऱ्या मुलासारखें— समजून क्षणोक्षणी तिच्या कृत्यांवर नजर ठेवून आणि खाण्यापिण्यापासून प्रत्येक लहानमोठ्या गोष्टी अमुकच रीतीने केल्या<noinclude></noinclude> pr12gspx1rdhshaiaagpff0owf7sm73 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८६ 104 111166 233756 2026-07-27T12:22:48Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233756 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८१)}}</noinclude>पाहिजेत असा निर्बंध करून समाजशास्त्रज्ञांच्या आतांच सांगितलेल्या मताच्या अगदीं मुळावरच कुऱ्हाड घातली आहे. त्यांनी व्यक्तीला आत्मोन्नतीचे दरवाजे मुळींच खुले ठेविले नाहींत. असल्या नियमांनीं समाजाची सुधारणा होणें अशक्य आहे. धर्मशास्त्रकारांनीं घालून दिलेल्या आज्ञांप्रमाणें निमूटपणें वागणाऱ्या समाजांतील व्यक्तींचे विचार गुलामाला योग्य असेच बनतात. अशा व्यक्तींचा आणि कैद्यांचा आयुष्यक्रम सारखाच!<br>{{gap}}वडिलांनी सक्तीनें घालून दिलेले नियम झुगारून देऊन त्याच्या उलट वागण्याकडे बहुधा मुलांची प्रवृत्ति असते. पण ज्या गोष्टीबद्दल असे नियम घालून द्यावयाचे त्या गोष्टी करण्यापासून किंवा न करण्यापासून तुमचा असा असा फायदा होईल, असें जर वडिलांनी आपल्या मुलांस नीट समजावून सांगितले तर तीं मुलें आपण होऊन त्यांच्या इच्छेप्रमाणें वागतील. एकंदरींत पाहतां आमच्या धर्मशास्त्रकारांनीं सुरू केलेल्या, व्यक्तीला आत्मोन्नतीचा मार्ग बंद करणाऱ्या, सक्तीपेक्षां आपखुषीच जास्त चांगली असे म्हणणें भाग आहे. आमच्या शास्त्रकारांनीं आम्हांला स्वत्रंतपणें आमच्या विचारशक्तीचा उपयोग करण्याचा मार्ग न ठेविल्यामुळेच इतर देशांप्रमाणे आमच्या देशांत सामाजिक सुधारणेचें बीं लौकर रुजत नाहीं. सुधारणेसंबंधी एखादा भानगडीचा प्रश्न उपस्थित झाला म्हणजे आम्ही आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा स्वतंत्रपणे उपयोग करून तो सोडविण्याच्या भानगडीत न पडतां सदासर्वदां दुसऱ्याच्या तोंडाकडे पहात राहतों. आमचे प्रत्येक आचार नियमबद्ध करून टाकणाऱ्या शास्त्रकारांनी आम्हांला सर्वस्वीं परावलंबी करून टाकल्यामुळे आमची प्रगति बहुतेक खुंटल्यासारखी झाली आहे. आम्ही बौद्धिक वादविवाद करूं आणि तो करीत असतां आमच्या चुका आमच्या नजरेस येऊन एखाद्या प्रश्नासंबंधानें आमची खात्रीही कदाचित् होईल, पण खात्रीप्रामाणे वागणूक मात्र आमच्या हातून कधींही<noinclude><br>{{gap}}६</noinclude> cgp69io58u3o551pljakv7ig5fr42hk पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८७ 104 111167 233757 2026-07-27T12:25:33Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233757 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८२)}}</noinclude>होणार नाहीं. कारण आमच्यांतील आत्मविश्वास पार नाहींसा झालेला आहे आमच्या स्वतःमध्यें कांही कर्तबगारी आहे; आम्हांला कांहीं बुद्धि, कांहीं विचारशक्ति आहे; असें आम्हांला मुळीं वाटतच नाहीं. गॅलिलिओसारखी, विचार करून आपले मत स्पष्टपणे लोकांपुढे मांडून सत्याकरितां कष्ट सोसणारी माणसें, आमच्या देशांत फारशी निर्माण झाली नाहींत तीं आमच्या ह्या परावलंबीपणामुळेच. आम्हांला मुलें समजून आमचें जीवित सक्तीच्या नियमांनी बद्ध करून टाकण्याचा हा परिणाम आहे.<br>{{gap}}आतां मायावादासंबंधानें थोडा विचार करूं. आम्ही इतर देशांतील लोकांपेक्षां मोठे दानशूर! असा आमचा लौकिक आहे. पण मी म्हणतों कीं, आमचे दातृत्व बैठें आहे. कोणी मनुष्य आमच्या दाराशीं आला आणि मदत मागूं लागला तर मात्र आम्हीं ती त्याला देऊं. याचेंच नांव बैठे दातृत्व. धार्मिक विचारांनी आम्हांमध्यें उत्पन्न केलेला दातृत्व हा एक सद्गुण आहे. आपण दिलेल्या मदतीचा ती घेणारा मनुष्य कसा उपयोग करतो, हें आपण पहात नाहीं. यामुळे पुष्कळ वेळां आमचें दान अपात्र होते. शिवाय आमच्या दातृत्वांत चेतना मुळींच नसते. जेथें जेथें दारिद्र्य- जेथें जेथें दुःख असेल आणि जेथे जेथें अन्याय होत असेल, तेथें तेथें जाऊन तें दारिद्र्य कमी करणें तें दुःख नाहींसें करणें आणि तो अन्याय दूर करणें, असलें सचेतन अथवा धांवतें दातृत्व आमच्या ठिकाणी नाहीं.<br>{{gap}}दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या माझ्या एका मित्रानें इंग्रज लोकांच्या न्यायप्रियतेची जी एक गोष्ट मला सांगितली ती उदाहरणादाखल मी तुम्हांला येथ सांगतों. माझ्या मित्राचें तेथें एक दुकान आहे. त्याच्या शेजारी तसलेच दुसऱ्या एका गृहस्थाचे एक दुकान होतें. यामुळे या दोन दुकानदारांमध्ये चुरस लागली. आणि शेवटी ती इतकी विकोपास गेली कीं, तो शेजारचा दुकान-<noinclude></noinclude> 86kwl5n5dno4bpxciks2hlesqmndgch पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८८ 104 111168 233758 2026-07-27T12:28:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233758 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८३)}}</noinclude>दार त्याचा द्वेष करूं लागला. एकदां असें झालें कीं, माझ्या त्या स्नेह्याच्या दुकानावरील एका नोकरानें आत्महत्या केली. आपला सूड उगविण्यास ही संधि बरी आहे, असें समजून त्या शेजारच्या दुकानदाराने माझ्या स्नेह्यावर खुनाचा आरोप आणिला. खटला चालू झाला. पुरावा हवा तसा झाला आणि ज्यूरीनेंही त्याला अपराधी ठरविलें. इतक्यांत माझ्या मित्राच्या दोघा इंग्रज गिऱ्हाइकांस ही बातमी कळली. ते जवळच रहात होते. प्रेतावरील ज्यूरींत ते हजर होते. पण पुराव्याच्या वेळीं त्यांची नांवें गाळली होती. माझ्या मित्रासंबंधानें होत असलेला तो अन्याय त्यांना सहन झाला नाहीं; आणि त्यांनी, आपणांस त्या खटल्यांतली सर्व हकीकत माहीत असून, आपण प्रेतावरील ज्यूरींत हजर असतां, आपला पुरावा घेतला नाहीं तो घेण्यांत यावा; असा न्यायाधीशाकडे अर्ज केला. हे दोघेही इंग्रज व्यापारी त्या शहरांत चांगले प्रसिद्ध होते म्हणून न्यायाधीशाने त्यांचा अर्ज मंजूर करून त्यांचा पुरावा घेण्यावर खटला तहकूब ठेविला. हा पुरावा झाल्यावर तो खटला केवळ व्यापारी चढाओढीमुळेच करण्यांत आला होता अशा न्यायाधीशाची खात्री होऊन त्यानें आरोपीस सोडून दिलें. असा प्रकार आपल्या ह्या विस्तीर्ण देशांत घडून येईल असे वाटत नाहीं. आमचें तत्त्वज्ञान कांहीं वेगळेच. लोकांच्या भानगडींत जा कशाला? खटला करणारे वेगळे, शिक्षा भोगणारे वेगळे! त्यांचे कांहीं कां होईना! 'बाजारच्या भाकरी भाजण्याचें आम्हांला कारण काय' असेंच आम्हीं म्हणणार! कारण आमची परोपकार बुद्धि बैठी पडली! अन्यायाच्या ठिकाणी आपण होऊन धांव घेऊन तो अन्याय दूर करण्याइतका जोम आमच्या परोपकारबुद्धीमध्यें नाहीं. ही आपल्या समाजांतील एक उणीव आहे. जगांत ज्या ज्या ठिकाणीं अन्याय, दारिद्र्य आणि दुःख असल्याचे दिसून येईल; त्या त्या ठिकाणीं जाऊन तें नाहींसें करण्याचा प्रयत्न करणे, हें आपलें एक सामा-<noinclude></noinclude> r71ys00r7g13gsv4ya0n1jtsig3bja6 पान:जातिभेदविवेचन.pdf/१ 104 111169 233759 2026-07-27T12:29:11Z QueerEcofeminist 918 /* Not proofread */ 233759 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>A FEW DISCRIMINATIVE THOUGHTS ON CASTE BY BABA PADMANJI. जातिभेदविवेचन. BOMBAY TRACT AND BOOK SOCIETY. 3rd Edition. 16mo. 2,000 Copies. Bombay. PRINTED AT THE NIRNAYA-SAGAR PRESS. 1890. Price Anna. किंमत अर्धा आणा.<noinclude></noinclude> 0vas8f6yhxc4idhe45oqxp8pfhuk3iw पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/८९ 104 111170 233760 2026-07-27T12:30:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233760 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८४)}}</noinclude>जिक कर्तव्य आहे, असें मला वाटते. पण हें सर्व दृश्य जगत् मिथ्या मानून आपणाला त्याशीं कांहींच कर्तव्य नाहीं, असें समजण्याच्या या कल्पनेवरच आमच्या सामाजिक नियमांची उभारणी झाली असल्यामुळे आम्हांला ह्या कर्तव्याची जाणीवच राहिली नाहीं. आम्ही आपणांमधील ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.<br>{{gap}}आमच्या धर्मशास्त्राचा अथवा सामाजिक नियमांचा आणि चालीरीतींचा पाया ज्या मूलभूत कल्पनांवर घालण्यांत आला आहे त्या किती चमत्कारिक आणि समाजशास्त्रदृष्टया किती घातक आहेत हे आपल्या लक्ष्यांत आलेंच असेल. ह्या कल्पनांचा मोड करण्याकरितांच आम्हांला समाजशास्त्रसंमत तत्त्वांवर उभारलेल्या सामाजिक सुधारणेची फार अवश्यकता आहे. अशा सुधारणेवांचून आमच्या समाजाची वाढ आणि प्रगति होणें केवळ अशक्य आहे इतकें सांगून मी आज आपली रजा घेतों.<br><br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 37ds7mb8sh7ej8vgdnpdcjvs8yjqy7l पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९० 104 111171 233761 2026-07-27T12:30:57Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ व्याख्यान ५ वें. (ता. १३ ऑक्टोबर १९१३.) आमच्या वैवाहिक चाली व स्त्रियांचा सामाजिक दर्जा. सद्गृहस्थ आणि भगिनींनो, आमच्या समाजांत रूढ असलेल्या लग्नसंबंधींच्या चालीरीति आणि..." 233761 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ व्याख्यान ५ वें. (ता. १३ ऑक्टोबर १९१३.) आमच्या वैवाहिक चाली व स्त्रियांचा सामाजिक दर्जा. सद्गृहस्थ आणि भगिनींनो, आमच्या समाजांत रूढ असलेल्या लग्नसंबंधींच्या चालीरीति आणि आमच्या स्त्रियांचा आमच्या समा- जांतील दर्जा हा आजच्या व्याख्यानाचा विषय वादग्रस्त आहे. आजच्या विषयाचे दोनही भाग एकमेकांशीं जरी संबद्ध आहेत तरी आतां सांगितलेल्या अनुक्रमाप्रमाणेंच म्हणजे प्रथम वैवाहिक चालीबद्दल आणि नंतर स्त्रियांच्या स्थितीबद्दल मीं येथें विचार कर- ण्याचे योजिले आहे. विवाहसंस्थेसंबंधानें विचार करावयाचा म्हणजे, आम्हांमध्यें रूढ असलेल्या लग्नासंबंधाच्या दोन तीन चालींचा विचार केला पा हिजे; पण त्या चाली आणि त्यासंबंधानें उपस्थित झालेले प्रौढ- विवाह, पुनर्विवाह वगैरे प्रश्न यांचा बराच खल झालेला आहे. सुशिक्षित लोकांपैकीं सुधारक आणि पुराणाभिमानी या लोकांनी ह्या प्रश्नावर अनुकूल आणि प्रतिकूल अशी पुष्कळच चर्चा केलेली आहे. हे किंवा या सारखेच आमच्या लग्नविषयक चाली- रीतीपासून उपस्थित झालेले दुसरे प्रश्न ह्यांवर ह्या दोन पक्षांमध्ये गेलीं तीस चाळीस वर्षे सारखें रण माजून राहिलें आहे. या विषयावरील रण आमच्यांतच माजून राहिलें आहे असें नसून, आम्हांमधील कांहीं गोष्टींनीं दिपून जाऊन, आमचें तेवढें सर्व चांगलें असें मानणारे कांहीं युरोपियन व येथे राहून आमच्या चालीरीतींचें सूक्ष्म निरीक्षण करणारे कांहीं ख्रिश्चन मिशनरी लोक यांच्यामध्येही माजलेले आहे. सद्गृहस्थहो, आपणांस असल्या मतवैचित्र्यांतून आपला मार्ग शोधून काढावयाचा आहे. म्हणून मी आपणास ह्या विषयासंबंधी अनुकूल प्रतिकूल प्रमाणे देत बसत<noinclude></noinclude> aw1wakjr1x440gb7t8lc8tuxtg894lp 233782 233761 2026-07-28T05:15:25Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233782 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''व्याख्यान ५ वें.'''}}}} {{center|( सोमवार १३ आक्टोबर १९१३.)}} {{rule|5em}} {{center|'''आमच्या वैवाहिक चाली व स्त्रियांचा सामाजिक दर्जा.'''}} {{gap}}सद्गृहस्थ आणि भगिनींनो, आमच्या समाजांत रूढ असलेल्या लग्नसंबंधींच्या चालीरीति आणि आमच्या स्त्रियांचा आमच्या समाजांतील दर्जा हा आजच्या व्याख्यानाचा विषय वादग्रस्त आहे. आजच्या विषयाचे दोनही भाग एकमेकांशीं जरी संबद्ध आहेत तरी आतां सांगितलेल्या अनुक्रमाप्रमाणेंच म्हणजे प्रथम वैवाहिक चालीबद्दल आणि नंतर स्त्रियांच्या स्थितीबद्दल मीं येथें विचार करण्याचे योजिले आहे.<br>{{gap}}विवाहसंस्थेसंबंधानें विचार करावयाचा म्हणजे, आम्हांमध्यें रूढ असलेल्या लग्नासंबंधाच्या दोन तीन चालींचा विचार केला पाहिजे; पण त्या चाली आणि त्यासंबंधानें उपस्थित झालेले प्रौढविवाह, पुनर्विवाह वगैरे प्रश्न यांचा बराच खल झालेला आहे. सुशिक्षित लोकांपैकीं सुधारक आणि पुराणाभिमानी या लोकांनी ह्या प्रश्नावर अनुकूल आणि प्रतिकूल अशी पुष्कळच चर्चा केलेली आहे. हे किंवा या सारखेच आमच्या लग्नविषयक चालीरीतीपासून उपस्थित झालेले दुसरे प्रश्न ह्यांवर ह्या दोन पक्षांमध्ये गेलीं तीस चाळीस वर्षे सारखें रण माजून राहिलें आहे. हे या विषयावरील रण आमच्यांतच माजून राहिलें आहे असें नसून, आम्हांमधील कांहीं गोष्टींनीं दिपून जाऊन, आमचें तेवढें सर्व चांगलें असें मानणारे कांहीं युरोपियन व येथे राहून आमच्या चालीरीतींचें सूक्ष्म निरीक्षण करणारे कांहीं ख्रिश्चन मिशनरी लोक यांच्यामध्येही माजलेले आहे. सद्गृहस्थहो, आपणांस असल्या मतवैचित्र्यांतून आपला मार्ग शोधून काढावयाचा आहे. म्हणून मी आपणास ह्या विषयासंबंधी अनुकूल प्रतिकूल प्रमाणे देत बसत<noinclude></noinclude> 7zhaapza691ptgh6if572a1q4jj0dpn पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९१ 104 111172 233783 2026-07-28T05:26:27Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233783 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८६)}}</noinclude>नाहीं. लग्नसंस्थेचा ऐतिहासिक दृष्टया विचार करून त्याबद्दल समाजशास्त्राचे काय सिद्धांत आहेत, तें मी आपणांस सांगणार आहे.<br>{{gap}}लग्नसंस्थेच्या पायावर समाजरचना होते. ॲरिस्टॉटल म्हणतो कीं, "समाजाचा उगम कुटुंबापासून होतो आणि कुटुंब हे लग्नसंस्थेपासून उत्पन्न होतें." अर्थात् समाजशास्त्रदृष्ट्या लग्नसंस्था फार महत्वाची आहे. ह्या संस्थेचा विचार करितांना समाजशास्त्रज्ञांना मोठी मौज वाटते. आणि यामुळेच लग्नममिांसाही समाजशास्त्राची एक अगदीं स्वतंत्र शाखा झालेली आहे. निरनिराळ्या समाजांचें आणि त्यांच्यामधील अनंत चालीरीतींचें निरीक्षण करून समाजशास्त्रज्ञांनी त्यांच्यामध्ये रूढ असलेल्या वेगवेगळ्या लग्नपद्धतींची मीमांसा केली आहे.<br>{{gap}}सर्व देशांत आणि सर्व समाजांत केव्हांही पहा लग्नसंस्थेला विशेष महत्व दिलेलें आहे असेंच आढळून येईल. समाजांत थोडीशी सुधारणा होतांच प्रथम लग्नसंस्थेला धार्मिक विधींची जोड देऊन ती पवित्र करण्यांत आली असेंच सर्वत्र दिसून येतें कोणत्याही समाजांत कांहींना कांहींतरी धार्मिक विधि झाल्यावांचून लग्न कायदेशीर मानण्यांत येत नाहीं. प्रत्येक समाजाला आपली लग्नपद्धति सर्वोत्कृष्ट वाटते, इतकेंच नव्हे तर ती ईश्वरदत्त आहे असेंही वाटते. पण आता एकमेकांपासून फारच भिन्न असलेल्या अशा सर्वच लग्नपद्धति उत्तम आणि ईश्वरदत्त आहेत असें म्हणणें सांप्रतच्या विचारयुगांतील विचारी लोकांना रुचेनासें झालें आहे; आणि त्यांनीं विशेष समाजांत विशेष प्रकारच्याच लग्नपद्धति कशा अमलांत आल्या, याचा शोध चालविला आहे. त्या शोधाची सविस्तर माहिती येथें सांगणें शक्य नाहीं, पण त्यांनीं आपल्या शोधांवरून जे सिद्धांत काढिले ते मात्र मी तुम्हांला सांगतों.<br>{{gap}}जुन्या समाजशास्त्रज्ञांचें म्हणणें आहे की :- "प्राचीन वाङ्मयावरून पाहतां ज्या वेळीं समाजामध्यें विवाह ही<noinclude></noinclude> de38aoc92yonyiz2et4or7go0rnf6aj पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९२ 104 111173 233784 2026-07-28T05:44:40Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233784 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८७)}}</noinclude>संस्था मुळींच अस्तित्वांत नसून स्त्रीपुरुषांचे संबंध मनसोक्त रीतीनें होत, असा एक काळ होता असे दिसून येतें; कांहीं रानटी लोकांत विवाह ज्याला म्हणतां येईल असा संस्कारच नाहीं असें प्रवासी लोकांच्या वर्णनावरून दिसतें, मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी यांच्यामध्ये असलेला निकट संबंध प्राणिशास्त्राने अगदीं कायमचा ठरविला आहे. मनुष्येतर प्राण्यांत वैवाहिक संबंध नाहीं अर्थात् फार प्राचीन काळीं तो मनुष्यप्राण्यामध्येही नसून स्त्रीपुरुषांचे संबंध मनसोक्त रीतीनें होत असावेत; व सर्व देशांतील सर्व समाज एका काळीं ह्या स्थितींतून गेले असले पाहिजेत, असे त्यांचें मत आहे.<br>{{gap}}जुन्या समाजशास्त्रज्ञांची ही मीमांसा चुकीची आहे, असें अलीकडच्या शोधावरून उघड होते. स्त्रीपुरुषांचा मनसोक्त संबंध मनुष्यप्राण्याच्या वृद्धीस फार घातक आहे, असें उत्क्रांतितत्त्व म्हणतें. मनुष्यप्राण्याइतका जन्मतः दुर्बल प्राणी दुसरा कोणी नाहीं. अर्थात् जीविताकरितां चाललेल्या प्राणिमात्रांच्या धडपडींत बालकाचा निभाव त्याचें संरक्षण करण्याकरितां आईबाप असल्यावांचून लागणें शक्य नाहीं. म्हणन अगदीं रानटी समाजांतही पतिपत्नीचा संबंध असलाच पाहिजे, असें आधुनिक समाजशास्त्रज्ञ प्रतिपादन करतात. मात्र हा पतिपत्नीभाव कांहीं निश्चित वैवाहिक पद्धतीनें आणि विशिष्ट धार्मिक विधीनें अस्तित्वांत येत असेल असें मात्र नाहीं; फक्त पतिपत्नी एकत्र रहाणें हा जो विवाहाचा एक परिणाम तो घडून कुटुंब अस्तित्वांत येण्यापुरताच कदाचित् तो संबंध असेल, असें त्यांचे म्हणणे आहे. रानटी समाजांतही अशा प्रकारचा पतिपत्नीभाव बालसंगोपनाकरितां आणि लोकसंख्येच्या वाढीकरितां असणें जरूर व इष्ट असून तो तसा असतो. हा भाव रानटी समाजांत असतो, इतकेंच नाहीं तर मनुष्येतर प्राण्यामध्येही तो असतो, असें त्यांनीं सिद्ध करून दाखविले आहे. उदाहरणार्थ, आपण<noinclude></noinclude> hi8n2uv3z27drf2ysbu5rsfccnb74kq पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९३ 104 111174 233786 2026-07-28T06:08:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233786 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८८)}}</noinclude>पक्ष्यांची जात घेऊं. पक्ष्यामध्यें ह्या प्रतिपत्नीभावाची झालेली वाढ फारच आश्चर्यकारक आहे. त्यांच्या कांहीं जातींत एकपत्नीव्रत पाळतात असें शोधकांच्या नजरेस आलेले आहे. मनुष्यप्राण्यापेक्षां निराळ्याच तऱ्हेच्या कांहीं लग्नपद्धति पक्ष्यांमध्ये आढतात, असें त्या पक्ष्यांचे विशेष निरक्षण करणारे लोक सांगतात. माकडांपासून मनुष्यप्राण्याची उत्क्रांति झालेली आहे. सबब माकडांबद्दल थोडा विचार करूं. त्यांच्या मध्येही पतिपत्नी हा भाव आहे म्हणजे माकड जातीचीं नरमादी एकत्र रहातात. सारांश, एकत्र राहणें ही गोष्ट अवश्य असून स्वाभाविक असल्यामुळे आधुनिक समाजशास्त्रवेत्ते लग्नें जेव्हां नव्हतीं अशा स्थितीत समाज केव्हांही नव्हता; अगदीं प्राचीन काळीं वैवाहिक विधि जरी नसला तरी पतिपत्नी एकत्र रहाण्याची वहिवाट होती, असे म्हणतात. ह्या वहिवाटीला त्यांनीं प्रथमावस्थेतील एकपत्नीक विवाह असें नांव दिलेले आहे.<Br>{{gap}}त्या काळीं जशी एक निश्चित विवाहपद्धति नव्हती. तशीच विवाहपद्धतीला धार्मिक विधीचीही जोड झालेली नव्हती, असें धर्माची ज्यांना नुसती कल्पनाही नाहीं अशा कांहीं जाती असूनसुद्धां आढळतात त्यावरून वाटतें. संतति थोडी मोठी होण्यास जो कमजास्त वेळ लागतो तितका वेळ सर्वच प्राण्यांत पतिपत्नी एकत्र रहातात. पण विश्वास, प्रेम आणि नीति यांच्या कल्पनेच्या वाढीशिवाय विवाहबंधन सुदृढ होत नसल्यामुळें बाल्यावस्थेतील एकपत्नीक वैवाहिक बंधन फारच शिथिल असतें.<Br>{{gap}}अगदीं प्रथम साधारणपणे एकाच घराण्यांतील स्त्रीपुरुष पतिपत्नीभावाने राहून त्यांचीं कुटुंबें बनलीं व अशीं अनेक कुटुंबें एकत्र होऊन त्यांची एक जाति अथवा गोत्र बनलें; कांहीं दिवस प्रत्येक गोत्रांतील स्त्रीपुरुषांचे विवाह स्वतंत्रपणे होत राहिले. पण पुढे अगम्यगमनादि विचार मनांत येऊन एकाच गोत्रांतील<noinclude></noinclude> fkmcsjwtixd6ofojvsx6sfyrwsqb37p पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९४ 104 111175 233787 2026-07-28T06:11:15Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233787 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(८९)}}</noinclude>स्त्रीपुरुषांत विवाह होणें बरें नाहीं असें ठरलें आणि दुसऱ्या गोत्रांतील बायका जबरदस्तीने पळवून त्यांच्यांशीं लग्नें लावण्याचा प्रघात सुरू झाला. अशा प्रकारच्या लग्नांस 'राक्षसविवाह,' असे म्हणतात. या विवाहपद्धतीचे अवशेष इतर समाजांप्रमाणें आमच्या हिंदुसमाजामध्येही दृष्टीस पडतात. क्षत्रिय- मराठाजातींत वराशेजारी नेहमीं एक शस्त्र ठेवण्यांत येते. हें शास्त्र त्यांच्यामधील विवाहपद्धतीचे एक मुख्य उपलक्षण समजण्याची वहिवाट आहे. असल्या अवशिष्ट चिन्हांवरून पाहतां समाजामध्ये जाति अथवा गोत्र प्रस्थापित झाल्यानंतर पहिली जी विवाहाची पद्धति निघाली ती राक्षसविवाह पद्धति होय! ही पद्धति रूढ होण्याचे कारण पूर्वी एके ठिकाणीं सांगितलेंच आहे. स्वगोत्रांतील मुलीशीं लग्न करणें अयोग्य असून लग्न करावयाचें तें परगोत्रांतील मुलीशींच केलें पाहिजे, अशी जी समजूत तत्कालीन समाजांतील लोकांची झाली तीच ह्या राक्षस- विवाहपद्धतीच्या रूढीला मूळ कारण झाली.<Br>{{gap}}कांहीं दिवसांनंतर समाजामध्ये प्रेम, मैत्री वगैरे गुणांची वाढ होतांच जुलूम आणि कपट यावरच उभारलेली ही राक्षसविवाहाची चाल लोकांना त्याज्य वाटून त्यांनीं ती अजिबात वर्ज्य केली. आणि अशा रीतीनें मुलीच्या बापाला पैसे देऊन तिच्याशीं लग्न करण्याची नवीन विवाहपद्धति अमलांत आली. हिलाच आर्षविवाह पद्धति, असें म्हणतात. दुसऱ्या गोत्रांतील मुलगी जबरदस्तीनें न आणितां दुसऱ्या गोत्रांतील मनाजोगी मुलगी शोधून काढून तिच्या बापाला तिची किंमत द्यावयाची आणि तिच्याशीं लग्न लावावयाचें, अशी वहिवाट पडली. यावरून ह्या काळच्या समाजांत काटकसरीनें राहण्याची कल्पना रूढ झाली असावी असें दिसतें. समाज- सुधारणेबरोबर गृहकृत्यें वाढली; लोक गुरेढोरें बाळगूं लागले; शेतीभातीसारखे निरनिराळे व्यवसाय करूं लागले; अर्थातच हीं<noinclude></noinclude> 45gjt3hz93k1ab4qm3j6mkgl15e0h44 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९५ 104 111176 233788 2026-07-28T06:14:01Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233788 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९०)}}</noinclude>सर्व कामें करणें एकट्या पुरुषवर्गाला अशक्य होऊन श्रमविभागाचें तत्त्व अमलांत आलें. गृहकृत्यें, गुराढोरांची व्यवस्था आणि बालसंगोपन हीं कामें बायका करीत; आणि इतर कामांचा बोजा साहजिकच पुरुषांवर पडला. अशा स्थितींत आपल्या घरांतील कामें करण्यासारखी मुलगी दुसऱ्याला देणें म्हणजे आपलें नुकसान करून घेणें आहे असें वाटून बाप आपल्या मुलीचे पैसे मागूं लागला आणि तिला मागणी घालणारा ती पुढें आपल्या गृहकृत्याला उपयोगी पडणार म्हणून ते तिच्या बापाला देऊं लागला!<Br>{{gap}}पुढें समाजांत पितृवात्सल्यादि सद्गुणांची वाढ झाल्यानंतर आपली मुलगी विकून तिचे पैसे घेण्याची कल्पना लोकांना असह्य होऊन ही मुली विकण्याची चाल बंद पडली आणि लोक लग्नसमयीं आपल्या जावयानां वरदक्षिणा अथवा देणगी देऊ लागले. अशा रीतीनें समाजाच्या परिणतीबरोबर स्वाभाविकपणे एकापेक्षां अधिक परिणत अशा विवाहपद्धति अमलांत आल्या.<Br>{{gap}}कुटुंबरचनेच्या दृष्टीने विचार करतां - १ एकपत्नीत्व म्हणजे एका पुरुषानें एका वेळी एकाच स्त्रीशी विवाह करणें अथवा एकपतित्व म्हणजे एका स्त्रीने एका वेळी एकाच पुरुषाशी विवाह करणे; २ बहुपत्नीत्व म्हणजे एका पुरुषाने एकाच वेळीं हव्या तितक्या बायका करणें, आणि ३ बहुपतित्व म्हणजे एकाच वेळीं एका स्त्रीनें हव्या तितक्या पुरुषांशीं लग्न लावणे, असे विवाहाचे एकंदर तीन निरनिराळे प्रकार दिसून येतात. व प्रत्येक समाजांत केव्हांना केव्हा तरी स्त्रीपुरुषांचा समागम मनसोक्त रीतीने होत असे, हा जुन्या समाजशास्त्रज्ञांचा गैरसमज आधुनिक समाजशास्त्रज्ञांचीं मतें देऊन मी पूर्वी खोडून काढलाच आहे. बहुपतित्वाची चाल एका काळी प्रत्येक समाजांत होती, असा त्यांचा दुसरा गैरसमज आहे. पण ह्या त्यांच्या विधानासही हवा तसा पुरावा नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> n2hb80zm2ro75ne4hwivi8m80urzq3m पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९६ 104 111177 233789 2026-07-28T06:15:59Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233789 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९१)}}</noinclude>{{gap}}विशेष कारणांनीं विशेष प्रसंगीच एखाद्या समाजांत बहुपतित्वाची चाल रूढ झाल्याचे आढळून येईल. कांहीं अनपेक्षित गोष्टीनें एका समाजांत स्त्रियांचा तुटवडा पडला आणि त्यांतील प्रत्येक पुरुषाला स्वतंत्र बायको मिळणें अशक्य झालें तर अनेक पुरुषांनी एकाच स्त्रीशीं लग्न करून राहण्याची पद्धति सुरू होते. बायका मिळण्याची अडचण असली म्हणजे बंधुप्रेमाने भाऊ भाऊ मिळून एक बायको करण्याची प्रवृत्ति होते व मग ती चालच होऊन जाते.<Br>{{gap}}तसेच कांहीं कारणांनी समाजांत स्त्रिया बऱ्याच मोठ्या मिळकतीच्या मालकिणी बनल्या तर पुरुषांना त्यांच्यावर अवलंबून रहावे लागतें व असें झाले म्हणजे एका स्त्रीजवळ पुष्कळ पुरुष लग्न करूं इच्छितात व अशा स्थितीत ही बहुपतित्वाची चाल पडते. अर्थात् बहुपतित्वाची चाल ही अपवादात्मकच असते. यावरून बहुपतित्वाची चाल सर्वत्र रूढ झालेली होती असे म्हणतां येणार नाहीं. पण बहुपत्नीत्वाची चाल मात्र कोणत्याना कोणत्या तरी काळीं प्रत्येक समाजांत रूढ झालेली होती असें दिसून येतें. बहुपत्नीत्वाची चाल, राक्षसविवाहपद्धतीमुळे प्रचारांत आली असावी. लग्न झालेला मनुष्य लढाईवर गेला आणि लुटींत त्याला एक स्त्री मिळाली अशी कल्पना आपण करूं. अशा प्रसंगीं एक बायको हयात असतां तो ह्या दुसऱ्या बायकोशी लग्न करतो. ह्याचेंच नांव बहुपत्नीत्व. उद्योगशील समाजांतही बहुपत्नीत्वाचा प्रचार पडतो. कारण अशा वेळीं श्रम करण्याकरितां माणसे हवीं असतात; लग्न लावून बऱ्याचशा स्त्रिया गृहिणी म्हणून घरांत आणिल्या म्हणजे आपल्या धंद्याच्या कामी त्यांची मदत होऊन संपत्तीत भर पडते. शेतकऱ्यांचे आणि गांवोगांव भटकून अथवा गुरेढोरे पाळून निर्वाह करणाऱ्या लोकांचे जे समाज बनलेले आहेत<noinclude></noinclude> hbmgora9agg2rghxy3iq4eqee2s5jm3 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९७ 104 111178 233790 2026-07-28T09:03:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233790 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९२)}}</noinclude>त्यामध्यें विशेषतः ही बहुपत्नीत्वाची चाल अजूनही अमलांत असल्याचें दिसून येतें.<Br>{{gap}}बायको म्हणजे पुरुषाची एक मालमत्ता, अशी कल्पना ह्या बहुपत्नीत्वाच्या चालीच्या मुळाशीं असल्यामुळे, कामाकरितां, लहरी- करितां, चैनीकरितां व असल्याच दुसऱ्या कोणत्याही हेतूकरितां म्हणा पुरुष एकच वेळा अनेक बायकांशी लग्ने लावून त्यांना आपल्या घरी आणून ठेवितो आणि समाज त्याचें हें करणें मान्य करितो. ह्या चालीला अशा समजुतीचा हा पाठिंबा असल्यामुळेंच राक्षस आणि आर्ष विवाहाच्या चाली नष्ट झाल्यानंतरही ती समाजांत रूढ राहून पुष्कळ सुधारलेल्या समाजांत कांहीं काळपर्यंत राहण्याचा संभव आहे.<Br>{{gap}}आतांपर्यंत ज्या ज्या वैवाहिक चालींचा विचार आपण केला, त्या सर्वांमध्ये आपली नैसर्गिक जरूर भागविण्याकरितां पुरुषांनींच पुढाकार घेतलेला आहे, असें आपणांस दिसून येईल. मुलीच्या बापापासून जबरदस्तीनें, अथवा त्याला पैसे देऊन खरेदीच्या रूपानें मुली आणून त्यांच्याशीं लग्ने लावणारे किंवा यापेक्षां जास्त सुधारलेल्या पद्धतीप्रमाणें म्हटलें तरी वराला देणगी देऊन आपली मुलगी त्याला दान करणारे पुरुषच असतात. या लग्नाच्या बाबतीत कोणीही पुरुष जिचें लग्न करावयाचे तिची संमति कधीही घेत नाहींत. मुलगी ही बापाची एक मालमत्ता आहे, अशीच समजूत ह्या सर्व वैवाहिक पद्धतींच्या मुळाशीं असलेली दिसते. ही त्याची मालमत्ता राक्षसविवाहांत त्याजपासून जबरदस्तीने लुबाडून नेतात; आर्षविवाहांत ज्याला तिची जरूर असेल तो ती बापाला किंमत देऊन घेऊन जातो आणि तिसऱ्या सुधारलेल्या विवाहपद्धतींत बाप आपण होऊन आपल्या इच्छेप्रमाणें ती एखाद्याला दान म्हणून देऊन टाकतो. अर्थात् मालमत्ता मानण्यांत आलेल्या मुलीच्या संमतीचें कारणच उरत नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> 5jab759cl3ixtvijvauj7pggvhec1yh पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९८ 104 111179 233791 2026-07-28T09:06:21Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233791 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९३)}}</noinclude>{{gap}}यानंतर समाजाची प्रगति जसजशी होत गेली; नीतिविषयक कल्पनांची जसजशी वाढ झाली आणि प्रेमादि मनोविकार जसजसे वृद्धिंगत झाले तसतसा उपरिनिर्दिष्ट सुधारलेल्या लग्नपद्धतींत सुद्धां आपली कन्या वाटेल त्याला दान देण्याचा बापाचा अधिकार कमी होऊन स्वयंवराची चाल प्रचारांत आली. स्वयंवराच्या पद्धतीनें जीं लग्ने होतात ती केवळ वधूवरांच्या परस्पर पसंतीनें आणि संमतीने होतात. त्यांत आईबापांच्या संमतीचा संबंध फक्त औपचारिक असतो. स्वयंवरविवाहांतील वधूवरें चांगलीं प्रौढ असल्यामुळे असल्या विवाहापासूनच सर्वोत्कृष्ट अशा एकपत्नीव्रताचा प्रादुर्भाव समाजांत होतो.<Br>{{gap}}समाजशास्त्राला अनुसरून क्रमशः लग्नपद्धतीत होत गेलेल्या सुधारणा आतांपर्यंत केलेल्या विवेचनावरून आपल्या लक्षांत आल्याच असतील. स्त्रीपुरुषांचे मनसोक्त विहार समाजांत केव्हांही रूढ नव्हते. अपत्यसंगोपनाकरितां स्त्रीपुरुष कांहीं काळपर्यंत एक प्रकारच्या बंधनानें बांधले जाऊन एकत्र रहात असत. यानंतर राक्षस विवाह आणि राक्षसविवाहानंतर आर्षविवाह समाजांत चालू झाले. बहुपत्नीत्व आणि बहुपतित्व हे प्रकारही याच सुमारास समाजांत शिरले असावे. पण बहुपतित्व हें नैमित्तिक व अपवादात्मक होतें. बहुपत्नीत्व मात्र सार्वत्रिक असून तें राक्षस व आर्षविवाहपद्धतीचा परिणाम म्हणून समाजांत रूढ झालेले आहे. आर्षविवाहानंतरची पायरी सालंकृत अथवा सदक्षिण कन्यादानाची आहे. यापुढली पायरी वधूवराच्या परस्पर पसंतीनें आणि संमतीने होणाऱ्या स्वयंवराची आहे. सर्वोत्कृष्ट एकपत्नीव्रत ह्या स्वयंवरपद्धतीपासून उत्पन्न झालेलें आहे, असा आतांपर्यंत केलेल्या विवेचनाचा मथितार्थ आहे.<Br>{{gap}}अशा प्रकारें समाजशास्त्राच्या अनुरोधानें लग्नाच्या चालीरीति क्रमशः बदलत गेल्या, ही गोष्ट हिंदुसमाजापुरतीच विचार करून<noinclude></noinclude> sr1is47unu1p259w76irfwz6u7w7c0d पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/९९ 104 111180 233792 2026-07-28T09:08:03Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "कितपत खरी ठरते हे आतां आपण पाहूं. आमच्या स्मृतिकारांनीं लग्नाचे निरनिराळे आठ प्रकार सांगितले आहेत, हे सर्वांस महशूरच आहे. ह्या आठ प्रकारांचा उल्लेख प्रथम मनूनें आपल्या स्मृतींत..." 233792 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९४)}}</noinclude>कितपत खरी ठरते हे आतां आपण पाहूं. आमच्या स्मृतिकारांनीं लग्नाचे निरनिराळे आठ प्रकार सांगितले आहेत, हे सर्वांस महशूरच आहे. ह्या आठ प्रकारांचा उल्लेख प्रथम मनूनें आपल्या स्मृतींत केला असून त्याचाच अनुवाद आमच्या इतर स्मृतिकारांनीं केलेला आहे. मनूच्या ह्मणण्याप्रमाणे विवाहाचे आठ प्रकार एका काळीं अमलांत होते, असें ह्मणावें लागतें. मात्र त्यांपैकीं कांहीं गौण आहेत, कांहीं शिष्टसंमत आहेत आणि कांहीं फक्त विशिष्ट जातींतील लोकांकरितांच आहेत, असा मनूचा अभिप्राय आहे. वस्तुतः पाहतां मनूनें सांगितलेल्या विवाहाच्या आठ पद्धत म्हणजे विवाहाचे एकाच काळी समाजांत रूढ असलेले निरनिराळे प्रकार नसून ज्या आठ पायऱ्यांनी वैवाहिक पद्धतीची परिणति झाली त्या आठ पायऱ्याच आहेत. मी आतांपर्यंत सांगितलेल्या वैवाहिक परिणतीच्या पायऱ्यांशीं त्यांचे कसें साम्य आहे, हें मी आतां आपणांस थोडक्यांत सांगतों.<Br>{{gap}} मन्वादि आमच्या स्मृतिकारांनी विवाहाचे जे आठ प्रकार सांगि- तले आहेत ते असे:- पहिला प्रकार - ब्राह्मविवाह - या विवाहांत वधूचा बाप आपल्या मताप्रमाणे चांगला कुलीन आणि विद्वान् वर पाहून त्याला आपली मुलगी सालंकृत करून देतो. .6 दुसरा प्रकार - देवविवाह-यज्ञ चालू असतां ऋत्विजाचे काम करणाऱ्या विद्वानाला अलंकारयुक्त कन्या देणें. तिसरा प्रकार - आर्षविवाह - वरापासून दोनचार गाई घेऊन मुलीचा विवाह त्याजशीं करगें हा आर्षविवाह समजावा. चौथा प्रकार - प्राजापत्य- ह्या विवाहांत वधूचा बाप वराला फक्त तुम्हीं उभयता चिरकाल एकत्र नांदून आपलीं धर्मकृत्यें करा' असा आशीर्वाद देतो.<noinclude></noinclude> laygb5038geu87faq4m3zvitx4oisme 233793 233792 2026-07-28T09:10:38Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233793 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९४)}}</noinclude>कितपत खरी ठरते हे आतां आपण पाहूं. आमच्या स्मृतिकारांनीं लग्नाचे निरनिराळे आठ प्रकार सांगितले आहेत, हे सर्वांस महशूरच आहे. ह्या आठ प्रकारांचा उल्लेख प्रथम मनूनें आपल्या स्मृतींत केला असून त्याचाच अनुवाद आमच्या इतर स्मृतिकारांनीं केलेला आहे. मनूच्या ह्मणण्याप्रमाणे विवाहाचे आठ प्रकार एका काळीं अमलांत होते, असें ह्मणावें लागतें. मात्र त्यांपैकीं कांहीं गौण आहेत, कांहीं शिष्टसंमत आहेत आणि कांहीं फक्त विशिष्ट जातींतील लोकांकरितांच आहेत, असा मनूचा अभिप्राय आहे.<Br>{{gap}}वस्तुतः पाहतां मनूनें सांगितलेल्या विवाहाच्या आठ पद्धत म्हणजे विवाहाचे एकाच काळी समाजांत रूढ असलेले निरनिराळे प्रकार नसून ज्या आठ पायऱ्यांनी वैवाहिक पद्धतीची परिणति झाली त्या आठ पायऱ्याच आहेत. मी आतांपर्यंत सांगितलेल्या वैवाहिक परिणतीच्या पायऱ्यांशीं त्यांचे कसें साम्य आहे, हें मी आतां आपणांस थोडक्यांत सांगतों.<Br>{{gap}}मन्वादि आमच्या स्मृतिकारांनी विवाहाचे जे आठ प्रकार सांगितले आहेत ते असे:-<Br>{{gap}}'''पहिला प्रकार-''' ब्राह्मविवाह- या विवाहांत वधूचा बाप आपल्या मताप्रमाणे चांगला कुलीन आणि विद्वान् वर पाहून त्याला आपली मुलगी सालंकृत करून देतो.<Br>{{gap}}'''दुसरा प्रकार-''' देवविवाह- यज्ञ चालू असतां ऋत्विजाचे काम करणाऱ्या विद्वानाला अलंकारयुक्त कन्या देणें.<Br>{{gap}}'''तिसरा प्रकार-''' आर्षविवाह- वरापासून दोनचार गाई घेऊन मुलीचा विवाह त्याजशीं करगें हा आर्षविवाह समजावा.<Br>{{gap}}'''चौथा प्रकार-''' प्राजापत्य- ह्या विवाहांत वधूचा बाप वराला फक्त 'तुम्हीं उभयता चिरकाल एकत्र नांदून आपलीं धर्मकृत्यें करा' असा आशीर्वाद देतो.{{nop}}<noinclude></noinclude> eub6zdi5bui7ljuefw2ywtzuq7df75c पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०० 104 111181 233794 2026-07-28T09:14:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233794 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९५)}}</noinclude>{{gap}}'''पांचवा प्रकार-''' आसुर- मुलीच्या नातेवाइकांना वरानें शक्य तितक्या देणग्या देऊन नंतर तिच्याशी लग्न करावें, अशी आसुर- विवाहाची मुख्य अट आहे.<Br>{{gap}}'''सहावा प्रकार-''' गांधर्व- स्वतःच्या इच्छेनुसार वधूवरांचें जें लग्न होतें त्यास गांधर्वविवाह असें म्हणतात.<Br>{{gap}}'''सातवा प्रकार -''' राक्षस- वधूच्या नातेवाइकांशी लढून तिला जबरदस्तीनें आपल्या ताब्यांत घेऊन तिच्याशीं वराचें लग्न होतें.<Br>{{gap}}'''आठवा प्रकार-''' पैशाच- निजलेल्या किंवा मादक पदार्थाच्या सेवनानें बेशुद्ध स्थितात असलेल्या वधूला नेऊन तिच्याशीं बलात्कारानें लग्न लावणें, हा पैशाचविवाह होय.<Br>{{gap}}असे विवाहाचे एकंदर आठ प्रकार आहेत, असे आपण मानतों. याशिवाय बहुपतित्वांसंबंधानेही संस्कृत वाङ्मयांत उल्लेख केलेला आहे. द्रौपदी ही पांच पांडवबंधूंची स्त्री होती, हें सुप्रसिद्धच आहे. द्रौपदीच्या बापाला आपल्या मुलीने पांच नवरे करावे ही गोष्ट पसंत नव्हती, पण 'तुम्हीं जें मिळवून आणाल तें आपसांत वांटून घ्या' अशी आपल्या आईची आज्ञा असून असे विवाह पूर्वी झाले आहेत असे जेव्हां पांडवांनी त्याला सांगितलें तेव्हां त्यानें त्या विवाहास आपली संमति दिली, अशी आख्यायिका आहे. तीवरून पाहतां असल विवाह आर्यलोकांना पसंत नव्हते असें जरी उघड दिसतें तरी ही विवाहपद्धति त्यांना माहीत असून अपवादादाखल क्वचित् प्रसंगीं ते होत असत, असें म्हणावें लागतें. बहुपत्नीत्व मात्र आर्यांच्या चांगलेच परिचयांतलें होतें. ऋग्वेदांत एकाच पुरुषास अनेक बायका असल्याचे दाखले पुष्कळ सांपडतात. यावरून ऋग्वेदकाळी एकपत्नीव्रत पाळणारे लोक नव्हते असे मात्र नाहीं. एकपत्नीव्रताची उदाहरणें ऋग्वेदांत आहेत इतकेंच नाहीं, तर ऋग्वेदकारांनीं तें व्रत पाळणारांची पुष्कळ स्तुति केली आहे. यानंतरच्या सुद्धां पुष्कळ संस्कृत कवींनीं एकपत्नीव्रताची तारीफच<noinclude></noinclude> dpvuwqtlpphgpkqc79jsid33i547sv6 233795 233794 2026-07-28T09:14:50Z कल्पनाशक्ती 3813 233795 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९५)}}</noinclude>{{gap}}'''पांचवा प्रकार-''' आसुर- मुलीच्या नातेवाइकांना वरानें शक्य तितक्या देणग्या देऊन नंतर तिच्याशी लग्न करावें, अशी आसुर- विवाहाची मुख्य अट आहे.<Br>{{gap}}'''सहावा प्रकार-''' गांधर्व- स्वतःच्या इच्छेनुसार वधूवरांचें जें लग्न होतें त्यास गांधर्वविवाह असें म्हणतात.<Br>{{gap}}'''सातवा प्रकार-''' राक्षस- वधूच्या नातेवाइकांशी लढून तिला जबरदस्तीनें आपल्या ताब्यांत घेऊन तिच्याशीं वराचें लग्न होतें.<Br>{{gap}}'''आठवा प्रकार-''' पैशाच- निजलेल्या किंवा मादक पदार्थाच्या सेवनानें बेशुद्ध स्थितात असलेल्या वधूला नेऊन तिच्याशीं बलात्कारानें लग्न लावणें, हा पैशाचविवाह होय.<Br>{{gap}}असे विवाहाचे एकंदर आठ प्रकार आहेत, असे आपण मानतों. याशिवाय बहुपतित्वांसंबंधानेही संस्कृत वाङ्मयांत उल्लेख केलेला आहे. द्रौपदी ही पांच पांडवबंधूंची स्त्री होती, हें सुप्रसिद्धच आहे. द्रौपदीच्या बापाला आपल्या मुलीने पांच नवरे करावे ही गोष्ट पसंत नव्हती, पण 'तुम्हीं जें मिळवून आणाल तें आपसांत वांटून घ्या' अशी आपल्या आईची आज्ञा असून असे विवाह पूर्वी झाले आहेत असे जेव्हां पांडवांनी त्याला सांगितलें तेव्हां त्यानें त्या विवाहास आपली संमति दिली, अशी आख्यायिका आहे. तीवरून पाहतां असल विवाह आर्यलोकांना पसंत नव्हते असें जरी उघड दिसतें तरी ही विवाहपद्धति त्यांना माहीत असून अपवादादाखल क्वचित् प्रसंगीं ते होत असत, असें म्हणावें लागतें. बहुपत्नीत्व मात्र आर्यांच्या चांगलेच परिचयांतलें होतें. ऋग्वेदांत एकाच पुरुषास अनेक बायका असल्याचे दाखले पुष्कळ सांपडतात. यावरून ऋग्वेदकाळी एकपत्नीव्रत पाळणारे लोक नव्हते असे मात्र नाहीं. एकपत्नीव्रताची उदाहरणें ऋग्वेदांत आहेत इतकेंच नाहीं, तर ऋग्वेदकारांनीं तें व्रत पाळणारांची पुष्कळ स्तुति केली आहे. यानंतरच्या सुद्धां पुष्कळ संस्कृत कवींनीं एकपत्नीव्रताची तारीफच<noinclude></noinclude> cbe7h00v7mcwuyupnd8vh2is38an6p7 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०१ 104 111182 233796 2026-07-28T09:17:12Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233796 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९६)}}</noinclude>केली आहे. भवभूतीनें आपल्या एका नाटकांत एकपत्नीव्रता फारच उत्तम चित्र रेखाटलें आहे. सारांश, एकपत्नीत्व आर्यलोकांन माहीत होतें. त्यांनी त्याची फार तारीफ केली आहे आणि एकपत्नीत्वाची गणना त्यांनी सर्वोत्कृष्ट लग्नांत केली आहे पण बहुपत्नीत्वाला ते धर्मबाह्य मानीत नव्हते. ह्यामुळे तीच चाल त्या वेळीं विशेष प्रचारांत होती. एकपत्नीक विवाहाला ते सर्वोत्कृष्ट मानीत, पण त्याची उदाहरणे त्यांच्यांत फारच थोडी सांपडतात.<Br>{{gap}}आतां आपण थोडे मागे जाऊन लग्नाच्या आठ प्रकारांचा समाजशास्त्राच्या धोरणानें विचार करूं. उत्क्रांतीच्या उलट क्रमानें ते आमच्या संस्कृत ग्रंथकारांनी दिलेले आहेत. ह्या प्रकारांपैकी शेवटचे पैशाच आणि राक्षसविवाह आमच्या धर्मशास्त्रकारांनीं महाभ्रष्ट अतएव त्याज्य मानले आहेत. ह्यावरून त्यांच्या वेळीं आमची बरीच नैतिक उन्नति झालेली होती हें उघड आहे. परंतु ज्याअर्थी त्यांनी आपल्या ग्रंथांतून ह्या दोन प्रकारांचा नामनिर्देश केला आहे त्याअर्थी ते पूर्वीच्या कांहीं समाजांत अथवा येथील मूळच्या लोकांत किंवा पूर्वकालीन आर्यलोकांत रूढ झालेले असावे असें वाटतें. पण समाजोन्नतीमुळे आमच्या ह्या धर्मशास्त्रकारांस ते लांछनास्पद वाटून त्यांनी ते सर्वयैव त्याज्य ठरविते. आसुरविवाहांत बाप आपल्या मुलीचे पैसे घेऊन ती वराला विकतो; म्हणून हा प्रकारही आमच्या धर्मशास्त्रकारांनीं निंद्यच ठरविला आहे. मुलीचा असा विक्रय करणें ही समाजाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे, असें त्यांना वाटलें. पण ज्याअर्थी त्यांनी लग्नपद्धतींत ह्या प्रकाराच उल्लेख केला आहे त्या अर्थी त्यांच्या पूर्वीच्या काळांत केव्हां तरी अश प्रकारचीं लग्ने होत असावीत, हे उघडच आहे. मुलीचे पैसे घेऊन तिचा उघड उघड विक्रय करणें हा रानटीपणा आहे, असें आमच्या धर्मशास्त्रकारांस वाटलें आणि उच्च वर्णांतल्या लोकांनीं तरी असला रानटीपणा करू नये, असा निर्बंध त्यांनी घातला. ब्राह्म, दैव, आर्ष<noinclude></noinclude> tfw80gmzkwl55rsdo0fdcfaikuzfhpy पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०२ 104 111183 233797 2026-07-28T09:20:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233797 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९७)}}</noinclude>आणि प्राजापत्य हे पहिले चार प्रकार मात्र आमच्या शास्त्रकारांस मान्य आहेत. यांपैकीं ब्राह्म आणि दैव या दोन्ही वैवाहिक पद्धतीत वधूच्या बापानें वराला मुलीबरोबर कांहीं देणगी देण्याची अवश्यकता असल्यामुळे या दोनही पद्धति जवळ जवळ एकच आहेत. प्राजापत्य विवाहपद्धतींत लग्न झाल्यानंतर वधूचा बाप त्या जोडप्याला फक्त आशीर्वाद देत असे. यावरून ही पद्धति स्वयंवराची अवशिष्ट असावी असें वाटतें; पण तिच्या वर्णनावरून तसें कांहीं निश्चित सांगतां येत नाहीं. आर्षविवाह हा आसुरविवाहाचा अवशिष्ट असावा. आसुर- विवाहांत वधूचे नातेवाईक शक्य तितक्या देणग्या वराकडून उकळवीत; पण आर्षविवाहांत वराने वधूच्या पित्याला फक्त चार दोन गाईच द्याव्या, असा नियम केलेला होता; अर्थात् आर्षपद्धति ही आसुरपद्धतीची सुधारलेली आवृत्ति होय. मराठे क्षत्रियांत जबरीच्या विवाहाचें अवशिष्ट म्हणून वराबरोबर जसें शस्त्र ठेवण्याची वहिवाट आहे तसेंच आसुरविवाहांत मुलीच्या किंमतीबद्दल हवी तितकी संपत्ति घेण्याचे ऐवजी, आर्षविवाहांत फक्त दोन चार गाई घेणें हें एक अवशिष्ट आहे.<Br>{{gap}}एकंदरीत विचार करितां अलीकडच्या समाजशास्त्रज्ञांनीं जबरीचा विवाह, कन्याविक्रय आणि वराला हुंडा देणें, असे जे विवाहाचे प्रकार दिले आहेत ते सर्व आमच्या संस्कृत ग्रंथांत आढळून येत असून त्यांनी दिलेल्या क्रमाप्रमाणेच त्यांची परिणति झाल्याचें आमच्या ग्रंथांवरून दिसून येतें. वधूवरांच्या परस्पर पसंतीनें आणि संमतीने होणाऱ्या गांधर्व विवाहाचें वर्णनही त्यांनी दिलें आहे. आमच्या पुराणग्रंथांत गांधर्वपद्धतीने झालेल्या विवाहाचे पुष्कळ दाखले सांपडतात. पण आमच्या धर्मशास्त्रकारांस ही गांधर्वविवाहपद्धति विशेष संमत होती असे दिसत नाहीं. ब्राह्मणवर्णात ह्या पद्धतीने विवाह झाल्याचा पुरावा नाहीं. आमच्या धर्मशास्त्रकारांनी ह्या विवाहपद्धतीची विशेष शिफारस<noinclude></noinclude> c9rxhlkopyhavi3phzvohitgwljksly पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०३ 104 111184 233798 2026-07-28T09:23:31Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233798 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९८)}}</noinclude>केलेली नाहीं, इतकेंच नव्हे तर हिच्या मुळाशीं कामवासना असें म्हणून त्यांनी ती गौणच मानिली आहे. मात्र राक्षस, पैशाच आणि आसुर ह्या तीन पद्धति जशा त्यांनी अगदीं त्याज्य ठरविल्या तशी ही ठरविली नाहीं इतकेच. आपल्या देशांतील कांहीं समाजांत ही पद्धति रूढ होती इतकेंच नाहीं तर जातिबंधने विशेष कडक होण्यापूर्वी आर्य लोकांतही ती रूढ होती. पण पुढें बालविवाह चालू झाल्यामुळें प्रौढपणीं वधूवरांनी एकमेकांस पसंत करून आईबापांच्या संमतीची विशेष पर्वा न करितां आपलें लग्न लावून घेण्याची म्हणजे गांधर्वविवाहाची ही चाल अर्थातच मागें पडली असावी, असें मला वाटतें. हिंदुस्थानांत बालविवाह केव्हां सुरूं झाला, हा प्रश्न वादाचा आहे. कारण पुराणांत प्रौढ- विवाहाची आणि लग्नसमयीं वधूवरें प्रौढ होत असल्यामुळे गांधर्व- विवाहाचीं अनेक उदाहरणें सांपडतात; ह्यावरून एकाकाळीं तरी आमच्यांत प्रौढविवाहाची चाल होती, ही गोष्ट उघड आहे. वधूवरांनीं प्रौढ वयांत एकमेकांस पसंत करून आपले लग्न लावून घेतलें म्हणजे आईबापांनी त्यांना आशीर्वाद देण्यापलीकडे कांहींच करावयाचें रहात नाहीं. यावरून पाहतां गांधर्व आणि प्राजापत्य ह्या दोन विवाहपद्धति एकाच काळीं अमलांत होत्या. पण पुढे मीं आपल्या गेल्या व्याख्यानांत सांगितल्याप्रमाणे कृत्रिम पवित्रपणाची खोटी कल्पना आमच्या समाजांत घुसल्यामुळें लग्नसमयीं वधूवरें प्रौढ झालीं असतां पावित्र्य बिघडते असे वाटून मुलीचे लग्न आमक्याच वर्षी करावें, असा नियम तत्कालीन धर्मशास्त्रकारांनी घालून दिला. आमच्या समाजांत बालविवाहाची चाल पडण्याचें, हे एक कारण होय.<Br>{{gap}}बायकानां वेद शिकण्याची मनाई करण्यांत आल्यापासून बालविवाहाची चाल प्रचारांत आली असावी असे मला वाटतें येथें मुलीचें लग्र आठव्या वर्षी करावें हें शास्त्रकारांचें मत लक्षांत<noinclude></noinclude> 2abslq8p3ffuv0vgjhffnkhqjfibdo4 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०४ 104 111185 233799 2026-07-28T09:26:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233799 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(९९)}}</noinclude>ठेवण्यासारखे आहे. आठव्या वर्षी मुलाची मुंज झाल्यावर त्यानें वेदाध्ययनास आरंभ करावा, हा शास्त्रकारांनी घालून दिलेला नियम सर्वात विदितच आहे. पूर्वी ज्या वेळी मुलाप्रमाणेच मुलींनाही वेदाध्ययनाचा अधिकार होता त्या वेळी त्यांच्याही मुंजी आठव्या वर्षी होत आणि त्या अध्ययनास आरंभ करीत. त्यांना वेदाध्ययनाची मनाई होतांच मुंजीचीही मनाई झाली. अर्थात् ज्या वर्षी मुंज व्हावयाची त्याच वर्षी त्यांचें लग्न करावे अशी मर्यादा घालण्यांत आली असावी. मुंजीऐवजीं त्याच वयांत लग्न! म्हणून मुलीचें लग्न आठव्या वर्षी करण्याची चाल पडून बालविवाह प्रचारात आला असावा असा माझा तर्क आहे, तो खराच आहे असें मी म्हणत नाहीं.<Br>{{gap}}पूर्वीचे राजे लोक, लग्न न झालेली मुलगी मनाप्रमाणे असेल तर खुशाल पळवीत आणि तिच्याशी लग्न लावीत, अशा स्थितींत मुलीच्या बापाला तिच्यावर हक्क सांगतां येत नसे. ही चाल ब्रह्मदेशांत अगदी अलीकडच्या काळापर्यंत चालू होती असें मी ऐकिलें आहे; असो. तेव्हां राजे लोकांना अशी संधि मिळू नये म्हणून मुलीचे लग्न शक्य तितक्या लौकर करण्याची म्हणजे अर्थातच बालविवाहाची चाल पडली असावी, असाही कांहीं जणांचा तर्क आहे. बालविवाह कोणत्याही कारणानें प्रचलित झालेला असो, पण तो अमलांत आल्यावर गांधर्वविवाहाची चाल रूढ रहाणें शक्यच नव्हतें हें उघड आहे.<Br>{{gap}}बालविवाह सुरू झाल्यानंतर ब्राह्मविवाहपद्धति लोकांना सोयीची वाटली आणि बाकीच्या पद्धति मागे पडून तीच अमलत राहिली. हल्लीच्या हिंदुधर्मशास्त्राप्रमाणे हीच विवाहपद्धति हल्लीं कायदेशीर मानण्यांत येते.<Br>{{gap}}सारांश, अलीकडच्या समाजशास्त्रज्ञांनी क्रमशः ज्या पायऱ्यांनी वैवाहिक पद्धतीची वाढ झाली म्हणून सांगितले आहे त्या सर्व<noinclude></noinclude> ewcgb69ikug9i3n6necv2cx91vie3hs पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०५ 104 111186 233800 2026-07-28T09:29:31Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233800 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१००)}}</noinclude>पायऱ्या आर्यलोकांना माहीत होत्या. कदाचित् निरनिराळ्या काळ आर्यांचे निरनिराळे समाज त्या पायऱ्यांवरून गेलेही असतील. पण त्यांच्यांत बालविवाहाची चाल सुरू झाल्यापासून गांधर्वविवाह आणि एकपत्नीव्रत ह्या परस्परावलंबी चाली राहिल्या नाहींत. इतकेंच नव्हे तर त्या त्यांच्या शास्त्रकारांनी बेकायदेशीर ठरविल्या! ब्राह्मविवाह आणि अनेकपत्नीत्व त्यांच्यांत चालू राहिले. आणि ब्राह्मविवाहपद्धतीप्रमाणेंच अनेकपत्नीत्वही हिंदुधर्मशास्त्राप्रमाणें कायदेशीर ठरलें!<Br>{{gap}}निरनिराळ्या सुधारलेल्या देशांतील विवाहसंस्थेच्या आणि वैवाहिक बंधनांच्या प्रगतीचा इतिहास पाहिला म्हणजे व्यक्ति-स्वातंत्र्याच्या वाढीबरोबरच त्यांची प्रगति झालेली दिसते. व्यक्तीच्या आयुष्यक्रमांत विवाह ही फारच महत्वाची बाब असल्यामुळे ज्यांचा विवाह व्हावयाचा त्यांचाच प्रत्यक्ष संबंध त्यांत असला पाहिजे. त्यांचें विवाहानंतरच्या आयुष्यांतील सुखदुःख आणि हितानहित ह्या विवाहावर अवलंबून असतें. म्हणून मुलांच्या कल्याणाबद्दल आईबापांच्या मनांत कितीही मोठी इच्छा असली तरी मुलांनी प्रौढवयांत आल्यावर एकमेकांच्या पसंतीनेच आपलीं लग्ने करून घेणे इष्ट आहे. आईबापांनीं त्यांत कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ करूं नये. असें ठरून गांधर्वविवाहपद्धति सुधारलेल्या राष्ट्रांनी प्रचारांत आणिली आहे. आमच्या देशांत गांधर्वविवाहाचीं उदाहरणें केवळ वाङ्मयांत आढळून येतात. परंतु सुधारलेल्या देशांत ही पद्धति लोकांनी प्रत्यक्ष आचरणांत आणलेली आहे आणि ह्या विवाहपद्धतीच्या साहचर्यानें असणारें जे एकपत्नीव्रत तेंही तिकडील कायद्यानें मान्य केलेले असून तिकडे कोणालाही एक बायको जिवंत असतां दुसरीशी लग्न करितां येत नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> 1covu1q31c6viymhwqfdw8wx8hzvw1t पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०६ 104 111187 233801 2026-07-28T09:33:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233801 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०१)}}</noinclude>{{gap}}असो, आतांपर्यंत केलेल्या विवेचनावरून वैवाहिक चालींच्या दृष्टीनें आपण सुधारलल्या देशाच्या किती मागे आहों ही गोष्ट आपल्या लक्षांत आलीच असेल. स्त्रियांची सामाजिक स्थिति बहुतांशी लग्नविषयक चालींवर अवलंबून असते. पाश्चिमात्य देशांत समाजांतील आपला दर्जा कायम करण्याकरितां, स्त्रिया जी चळवळ करीत आहेत ती सर्वविश्रुत आहे. स्त्रीपुरुषांना सर्व बाजूंनी पूर्णावस्थेस नेऊन पोचविणें हें समाजशास्त्राचें ध्येय असल्यामुळे त्यांच्या प्रगतीस कोणत्याही रीतीनें बाधक होणारे नियम त्या शास्त्राला संमत नाहींत. स्वाभाविकपणें स्त्रिया, ह्या पुरुषांपेक्षां थोड्या अशक्त असून कोणत्याही समाजाच्या पूर्वावस्थेत 'बळी तो कान पिळी' हाच न्याय प्रचलित असल्यामुळे सर्व देशांत आरंभी स्त्रियांची सामाजिक योग्यता पुरुषापेक्षां कमी मानण्यांत आलेली होती; व त्यांस त्यांच्यापेक्षां कमी हक्क देण्यांत आलेले होते असेंच दिसून येतें. अगदीं रानटी समाजांत मात्र स्त्रियांचा दर्जा पुरुषाइतकाच समजतात. समाजाच्या बाल्यावस्थेत जसें एक प्रकारचें एकपत्नीत्व रूढ असतें, तसेंच स्त्रीपुरुषांच्या कामाची वांटणी चांगलीशी झाली नसल्यामुळें तीं उभयतां समान हक्कानेंच रानटी समाजांत वागत असतात. पण समाजाची प्रगति होऊन त्याला संपत्तीचे महत्व कळू लागल्यानंतर धनोत्पादक कामें बहुधा पुरुषच करूं लागतात, अर्थात् धनसंपादन करणारे पुरुष असल्यामुळे त्यांनाच राजकीय सामाजिक, वगैरे सर्व प्रकारच्या बाबतींत महत्व मिळून स्त्रिया मागे पडतात. वंशपरंपरागत संपत्तीच्या योगानें श्रीमंत वर्गास राजकीय बाबतींत इतर लोकांपेक्षां जसे विशेष हक्क मिळाले तसेच संपत्ति मिळविणाऱ्या पुरुषांस समाजामध्यें स्त्रियापेक्षां अधिक हक्क मिळाले. पुढे श्रीमंतांप्रमाणेच गरीबांनाही राजकीय हक्क असले पाहिजेत, असें सुधारलेल्या राष्ट्रांस वाटू लागले. असें रोमसारख्या जुन्या राष्ट्राच्या अथवा अलीकडील युरोपीयन राष्ट्रांच्या इतिहासावरून दिसतें. सामाजिक बाबतीत स्त्रि-<noinclude></noinclude> ijh0ttz2tkyaeogfzqlmqyr0e5kkcdf पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०७ 104 111188 233802 2026-07-28T09:37:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233802 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०२)}}</noinclude>यांच्या हक्कासंबंधानेही असाच प्रकार दिसून येतो. केवळ सांपत्तिक कारणांनीं पुरुषांस सामाजिक वर्चस्व मिळाले आणि स्त्रियांची योग्यता कमी मानण्यांत येऊन त्यांचे अनेक हक्क नष्ट झाले. स्त्री हीं आपल्या सुखोपभोगाची एक वस्तु आहे असे वाटून संपत्तीमुळे अधिकारसंपन्न झालेले पुरुष आपल्या लहरीप्रमाणे असल्या अनेक वस्तू एकाच वेळीं आपल्या संग्रही ठेवू लागले. सारांश, समाजांत पुरुषांपेक्षां स्त्रियांची योग्यता कमी मानण्यांत येऊ लागल्यामुळेच अनेकपत्नीत्वाची चाल पडली. पुढें सुधारलेल्या राष्ट्रांनीं पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही सामाजिक हक्क असावे म्हणून प्रयत्न सुरू केले. ज्या देशांत एकपत्नीत्व प्रस्थापित झालें आहे, त्या देशांत हे प्रयत्न यशस्वी होऊन स्त्रियांस पुरुषांच्या बरोबरीचे सामाजिक हक्क मिळाले. आहेत असें ह्मणण्यास हरकत नाहीं.<Br>{{gap}}राजकीय बाबतींत श्रीमंतांचा आणि गरीबांचा दर्जा जसा एक तसाच सामाजिक बाबतींत पुरुषांचा आणि स्त्रियांचा दर्जा एकच असला पाहिजे, इतकें कबूल झाल्यावर विधवापुनर्विवाहासारखे प्रश्न आपोआपच सुटतील. पुरुषाची पत्नी अथवा स्त्रीचा पति मृत झाल्यावर दुसरे लग्न करणें किंवा न करणे, ही गोष्ट समाजानें ज्याच्या त्याच्या खुषीवरच ठेविली पाहिजे. एक पत्नी निवर्तल्यावर पुरुषाला जर दुसरी पत्नी करण्याची मोकळीक समाजानें ठेविली आहे तर एक पति वारल्यावर स्त्रीलाही दुसरा पति करण्याची मोकळीक समाजानें ठेविली पाहिजे. विधुरविधवांच्या पुनर्लग्नाचा प्रश्न नेहमी व्यक्तीच्या स्वभावावर आणि खुषीवरच अवलंबून असावा; समाजाने त्यांत ढवळाढवळ करू नये, हेंच विधवाविवाहसमर्थकांचें म्हणणें आहे. स्त्रीपुरुषांनी आपली वैवाहिक बंधनें दृढ करून कसल्याही प्रकारचे घाणेरडे संबंध प्रचारांत येऊ दिले नाहींत म्हणजे झालें. नैतिक दृष्ट्या समाजान त्यांजवर जें लक्ष ठेवावयाचें तें इतक्याचपुरतें ही गोष्ट मात्र समाजाने अगदीं डोळ्यांत तेल घालून पाहिली पाहिजे.<noinclude></noinclude> b6g35bi12magerg5s458fgpjy1pkby0 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०८ 104 111189 233803 2026-07-28T09:41:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233803 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०३)}}</noinclude>सामाजिक नीतीच्या संरक्षणाकरितां असले अपराध त्यान अगदीं अक्षम्य समजून अपराध्यास योग्य शासन करण्याच्या कामी कसूर करितां कामा नये! अमका विधुर लग्न करीत आहे किंवा तमकी विधवा पुनर्विवाह लावीत आहे असल्या गोष्टींकडे समाजानें लक्ष देण्याचें मुळींच कारण नाहीं. ह्या गोष्टी ज्याच्या त्याच्या विचारावरच ठेविल्या पाहिजेत. विधवा पुनर्विवाहाची चाल समाजानें मान्य करणें म्हणजे प्रत्येक विधवेने पुनर्विवाह लावलाच पाहिजे असा सक्तीचा नियम करणें नसून विवाहाची गोष्ट तिच्या इच्छेवर अवलंबून ठेवणें येवढाच या सुधारणेचा हेतु आहे, विधवा विवाह वाईट, पुनर्विवाह करणारी विधवा समाजाला काळिमा आणणारी आहे असे समजून समाजाने विधवाविवाहास जी बंदी केली आहे ती काढून टाकावी इतकेंच म्हणणे आहे. पुरुषाला एक बायको मेल्यावर दुसरी करण्याची मोकळीक असते, तशीच मोकळीक स्त्रियांनाही मिळाली पाहिजे आणि आपल्या हिंदुसमाजांत जी अनेकपत्नीत्वाची चाल आहे ती बंद करण्यांत आली राहिजे. सारांश, एकपत्नीव्रत व एकपतिव्रत आणि विधुरविधवांच्या पुनर्लग्नास मोकळीक, ह्याच वैवाहिक, चाली समाजशास्त्रसंमत असून समाजांत रूढ होणे इष्ट आहे.<Br>{{gap}}मालमत्तेच्या बाबतींत किंवा वारसाच्या संबंधांत स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचे हक्क ठेविलेले नाहींत. खालच्या वर्गाचे लोक वरच्या वर्गातील लोकांच्या बरोबरीचे हक्क आपणांस मिळावे म्हणून धडपड करीत असतात, असें इतिहासावरून दिसतें. स्त्रियांच्या हक्कासंबंधाचा प्रश्नही असाच आहे. सामाजिक, सांपत्तिक, राजकीय वगैरे बाबतींत आपणांस पुरुषांच्या बरोबरीचे हक्क असावे म्हणून स्त्रियांची खटपट चालू आहे. इंग्लंडांत मतवादी स्त्रियांचे जे प्रयत्न चालू आहेत त्यांच्या मुळाशीं तरी स्त्रीपुरुषांचें हे समानत्वच आहे.<Br>{{gap}}समाजाची वाढ होऊन त्याला पूर्णत्व यावे म्हणून सुधारलेल्या राष्ट्रांनीं स्त्रीपुरुषांस कांहीं हक्क ठेविलेले आहेत. स्त्रीपुरु-<noinclude></noinclude> pg7f4aur6oolr72jf4w62fjsd0o2xi8 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१०९ 104 111190 233804 2026-07-28T09:43:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233804 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०४)}}</noinclude>षांच्या सर्वांगपूर्णतेस आड येणारे नियम समाजशास्त्राला मुळींच पसंत नाहीत. आमचे सामाजिक नियम आमच्या उन्नतीच्या आड येणारे असल्यामुळे समाजसुधारणेची आम्हांला फार अवश्यकता आहे, असें मीं आपल्या व्याख्यानाच्या आरंभीं सांगितलें. उन्नत समाजांतील सुधारकांनीं ज्या दिशेने प्रयत्न करून आपल्या समाजाची प्रगति केली त्याच दिशेने आम्ही प्रयत्न करीत आहो. आमचे प्रयत्न फार उशिरां सुरू झाले आहेत इतकेंच! स्त्री- शिक्षण, स्त्रियांची सामाजिक योग्यता, वगैरे प्रश्न इतर राष्ट्रांनी एक शतकापूर्वीच सोडविले आहेत. स्त्रियांना कोणत्या प्रकारचे शिक्षण द्यावें, विश्वविद्यालयाच्या सर्वच शाखा त्यांना मोकळ्या असाव्यात की काय, वगैरे जे प्रश्न आज आम्हांपुढे आहेत तेच शंभर वर्षांपूर्वी पाश्चिमात्य राष्ट्रांसमोर येऊन त्यांना ते त्या वेळीं सोडवावे लागले. त्यांच्याच दिशेनें आज आम्हीं जात आहों, अर्थात् समाजशास्त्रदृष्ट्या आमचा मार्ग बरोबर आहे.<Br>{{gap}}असो, पुढील खेपेस आपण ह्यापेक्षांही भानगडीचे प्रश्न विचाराकरितां घेऊं; इतकें सांगून मी आज आपली रजा घेतों.<br><br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 0xdib6r11zy5tntb3xgy2owia8zeml0 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११० 104 111191 233806 2026-07-28T09:47:45Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233806 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''व्याख्यान ६ वें.'''}}}} {{center|( ता. २० आक्टोबर १९१३.)}} {{rule|5em}} {{center|'''जातिभेद व वर्णभेद.'''}} {{gap}}सभ्य गृहस्थ व भगिनींनो, आजच्या व्याख्यानाचा विषय फारच वादग्रस्त आगि भानगडीचा आहे, पण समाजशास्त्रदृष्टया तो अत्यंत महत्वाचा आहे. आपल्या हिंदुसमाजाची घटनाच मुळीं या जातिभेदावर व वर्णभेदावर झालेली आहे. समाजांतील हजारों चालीरीति व कल्पना याच संस्थेवर अवलंबून आहेत. तेव्हां या चालीरीतींचा शास्त्रीयदृष्ट्या विचार केल्यानें पुष्कळ गोष्टींचा आणि प्रश्नांचा समाधानकारक रीतीनें निकाल लागणार आहे. पण हा विषय समाजशास्त्रदृष्ट्या जितका महत्वाचा आहे तितकेंच त्याचें सविस्तर विवेचन करणें हें काम फार कठीण आहे व तासा सव्वा तासाच्या अवधींत तें होणें दुर्घट आहे. तेव्हां फारशा वाद- विवादांत न शिरतां सामाजिकशास्त्रदृष्ट्या जी जातिभेदाची उपपत्ति मला सयुक्तिक वाटते ती देऊन आणि शेवटीं या संस्थेचे जे बरेवाईट परिणाम हिंदुसमाजावर झालेले आहेत त्यांचा थोडक्यांत निर्देश करून मी आपली अखेरची रजा घेणार आहे. टीकात्मक विवेचन करणें हा या व्याख्यानमालेचा उद्देश नाहीं व तसें करणें थोड्या अवधीत शक्यही नाहीं म्हणून माझ्या आजपर्यंतच्या व्याख्यानांत मीं प्रचलित लेखांवर टीका केली नाहीं. पण आजच्या व्याख्यानांत मी या परिपाठाला विरुद्ध जाणार आहे कारण जातिभेदाच्या विषयावर शास्त्रीयदृश्या एक दोन स्वतंत्र ग्रंथ नुकतेच प्रसिद्ध झालेले आहेत व आणखीही होणार आहेत. या ग्रंथांचा जितका प्रसार समाजांत व्हावा तितका होत नाहीं, ही<noinclude></noinclude> ahamvveeewoqn036fr2qj75bbwxfudl पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१११ 104 111192 233807 2026-07-28T09:53:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233807 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०६)}}</noinclude>मोठ्या दिलगिरीची गोष्ट आहे. आमच्या समाजांत अजून शास्त्रीयबुद्धि किती कमी आहे हें यावरून दिसून येतें. हे ग्रंथ लिहिणारे गृहस्थ अमेरिकेतून डॉक्टरची पदवी घेऊन आलेले आहेत. त्यांनी तेथें समाजशास्त्राचाच अभ्यास करून ही पदवी मिळविली व ती मिळविण्याकरितां त्यांनीं जो निबंध लिहिला त्याचीच सुधारणा करून त्यांनीं आपला तो निबंध आतां पुस्तकरूपानें प्रसिद्ध केला. त्यानंतर दुसराही एक स्वतंत्र ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला आहे व या विषयावर आणखीही ग्रंथ लिहिण्याचा त्यांचा विचार आहे. आपल्या समाजांतील चालीरीतींचा शास्त्रीयदृष्टीने विचार करून त्यांचे सोपपत्तिक विवेचन करणारे ग्रंथ आमच्या सुशिक्षितांनी लिहिलेले फारच थोडे आहेत, या दृष्टीनें डॉक्टर केतकर यांचे अभिनंदन करणें जरूर आहे. पण या दोन ग्रंथांत त्यांनी दिलेली जातिभेदाची उपपत्ति व केलेलें जातिभेदाचें समर्थन हीं मात्र आक्षेपार्ह आहेत, असे मला वाटते व म्हणूनच त्यांच्या ग्रंथाचा व त्यांनी दिलेल्या उपपत्तीचा थोडक्यांत विचार करून मीं आपल्या मतें जातिभेदाची जी उपपत्ति ठरविली आहे ती आपल्यापुढे मांडण्याचा माझा विचार आहे.<br>{{gap}}डॉक्टर केतकर यांच्या पहिल्या ग्रंथांत मनुस्मृतीचा सामान्यतः सारांशच दिलेला आहे. मनुस्मृतींत जातिभेद व वर्णभेद याबद्दल ज्या कल्पना दिलेल्या आहेत त्यांचाच अनुवाद या ग्रंथांत केलेला आहे. यांचा दुसरा ग्रंथ जातिभेद व वर्णभेद यांची मीमांसा करणारा आहे, व यामध्ये त्यांनी हिंदूंच्या समाजव्यवस्थेचें समर्थन केलेलें आहे. त्यांचें म्हणणें असें आहे कीं, हिंदु समाजव्यवस्था विशिष्ट धर्ममतावर अवलंबून नाहीं. प्रत्येक मुसलमानी समाजाच्या घटकानें महंमदाचीं मतें मान्य केलीच पाहिजेत; प्रत्येक ख्रिस्ती समाजांतील मनुष्याने येशुख्रिस्ताचीं मतें मान्य केलींच पाहिजेत.<noinclude></noinclude> qmsroisrdzi08uywr9nqrl30yr30kuo पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११२ 104 111193 233808 2026-07-28T09:55:46Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233808 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०७)}}</noinclude>प्रत्येक बौद्धानें बुद्धाचीं मतें मानिली पाहिजेत, असा जसा या धर्मांचा कटाक्ष आहे, तसा हिंदुधर्माचा नाहीं.<br>{{gap}}या निरनिराळ्या धर्मांच्या समाजरचनेला डॉक्टर केतकर यांनीं 'विशिष्ट सांप्रदायावर अवलंबून असलेली समाजरचना' असें म्हटलें आहे व हिंदु समाजरचना अशा विशिष्ट सांप्रदायावर ठरविलेली नाही तर ती सनातन धर्मावर किंवा कर्तव्यकर्मावर ठरविलेली आहे व म्हणूनच हिंदु समाजरचना जास्त विस्तृत व कायमच्या पायावर उभारलेली आहे असे डॉक्टर केतकर यांचे म्हणणे आहे. डॉक्टर केतकर यांनी दाखविलेला हिंदुसमाज व इतर समाज यांमधील हा फरक काल्पनिक आहे. हिंदुधर्माचा सुद्धां मूळ पाया वेदावरच आहे, असें मानण्यांत येतें. 'प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु' ही हिंदुत्वाची व्याख्या म्हणून जोरानें प्रतिपादन करण्यांत येते. तेव्हां ज्याप्रमाणे मुसलमान लोक कुराणावर भरंवसा ठेवितात; ख्रिश्चन लोक बायबलावर भरवसा ठेवितात. त्याचप्रमाणें हिंदु लोक वेदांवर भरवता ठेवितात. मात्र मुसलमानी धर्मांत व ख्रिश्चन धर्मांत एका विशिष्ट पुरुषाशी त्यांच्या पवित्र ग्रंथाचा संबंध ऐतिहासिक दृष्टया जुळलेला आहे. वेदांची स्थिति अशी नाहीं. अत्यंत प्राचीनत्वामुळे वेदांना अपौरुषेय मानतात व म्हणून एका पुरुषाशीं त्यांचा संबंध जडलेला नाहीं. पण या क्षुल्लक परंतु ऐतिहासिक कारणांनी झालेल्या फरकामुळे हिंदु समाजरचनेचे वर्चस्व कसें सिद्ध होतें, हें समजत नाहीं. उलट मला असें वाटतें की, हिंदुसमाजांत वेदावर भरवसा ठेवणाऱ्याला हिंदु बनतां येत नाहीं. हिंदु बनण्यास त्याच हिंदुसमाजांत त्याला जन्म घ्यावा लागतो. यामुळें हिंदु समाजरचना संकुचित पायावर रचलेली आहे, असेंच म्हणणें जास्त सयुक्तिक आहे. पण ख्रिश्चन व मुसलमानी धर्मांत असा प्रकार नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude> jyv1x6tslbd43rah8n9vieu46u2p8bg पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११३ 104 111194 233809 2026-07-28T10:00:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233809 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०८)}}</noinclude>{{gap}}असो, डॉक्टर केतकर यांना समाजरचना धर्माच्या पायावर नसावी असे वाटते. ती राष्ट्रीयत्वाच्या पायावर असावी, असे त्यांचें मत आहे. अमेरिकेत धर्मावर राष्ट्रीयत्व अवलंबून नाहीं, तर तें स्थला वर आहे; जो जो मनुष्य अमेरिकेत कायमचा राहिला तो तो मनुष्य अमेरिकन समाजाचा घटक होतो. हीच स्थिति हिंदुसमाजाची आहे; कारण हिंदुसमाज अमुक ग्रंथावर किंवा अमुकच मतांवर विश्वास ठेविला पाहिजे, असा आग्रह धरीत नाहीं; जो त्यांच्या वर्णव्यवस्थेचे नियम पाळून सनातन धर्म पाळतो तो मनुष्य हिंदुधर्माच्या जातिभेदांत येऊ शकतो; कारण हिंदुधर्मांत नवीन नवीन जाति बनत असतात. तेव्हां हिंदुसमाजाची रचना अमेरिकेच्या समाजरचनेसारखी लवचिक आहे, अशी डॉक्टर केतकर यांनी आपली समजूत करून घेतली आहे. परंतु वास्तविक तसा प्रकार नाहीं. हिंदुसमाजांत पूर्वकाळीं अशा तऱ्हेचें बाहेरून मिश्रण झाले आहे खरें, तरी पण आमची वर्णभेदाची कलना लवचिक राहिली नाहीं व म्हणूनच हिंदुसमाजांत चार वर्णांच्या चार हजार जाति झाल्या व त्यामध्यें दळणवळणासंबंधीं व आचार- व्यवहारासंबंधीं हजारों कडक निर्बंध अमलांत आले व जातिभेद रचना समाजाची फाटाफूट करण्यास कारण झाली. तेव्हां डॉक्टर केतकर यांची तरफदारी वस्तुस्थितीस धरून नाहीं व ही गोष्ट त्यांनीं जातिभेदासंबंधी करावयाच्या सुधारणा म्हणून ज्या गोष्टी सुचविल्या आहेत त्यांवरूनही दिसून येतें. आतां डॉक्टर केतकर यांच्या जातिभेदाच्या उपपत्तीकडे वळू.<br>{{gap}}हिंदुस्थानांत वर्णभेद निरनिराळ्या रंगाच्या लोकांच्या एकत्र येण्यापासून झाला. ही जी वर्णभेदाच्या उत्पत्तीची प्रचलित कल्पना ती डॉ. केतकर यांनी अग्राह्य ठरविली आहे. त्यांचे मतें वर्णव्यवस्था ही पवित्रतेच्या कल्पनेवरून उत्पन्न झाली. कांहीं वर्ण आपल्या आचाराला जास्त पवित्र मानूं लागले व ज्यांचे<noinclude></noinclude> sfnn0tnp27hubkoe1cxr0q7t7q8pu8a पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११४ 104 111195 233810 2026-07-28T10:03:27Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233810 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१०९)}}</noinclude>आचार आपल्यापेक्षां भिन्न त्यांना निराळे समजूं लागले. कृत्रिम पवित्रपणा व कांहीं आचार दुसऱ्या आचारापेक्षां कभी शुद्ध अशाप्रकारची कल्पना, यावर सर्व जातिभेदाची व वर्णभेदाची इमारत उभारलेली आहे; असें डॉक्टर केतकर यांचें म्हणणें आहे. पण या उपपत्तीची स्थिति इंग्रजी म्हणीत सांगितल्याप्रमाणे घोड्यापुढे गाडी जुंपण्यासारखी आहे असें मला वाटतें, म्हणजे कृत्रिम पवित्रपणा हा जातिभेदाचा एक स्वाभाविक परिणाम आहे; तो जातिभेदाचें कारण नाहीं. तेव्हां या उपपत्तीने डॉक्टर केतकर यांनीं कार्यकारणभावाचें परिवर्तन केलें आहे. म्हणजे कारणाला कार्य व कार्याला कारण म्हटलें आहे आणि म्हणूनच ही त्यांची उपपत्ति सदोष आहे, असें म्हणावें लागतें. आतां अधिक वादविवादांत न पडतां समाजशास्त्रदृष्टया जी उपपत्ति मला सयुक्तिक वाटते ती मी आपल्यापुढे मांडतों.<br>{{gap}}हिंदुसमाजांतील जातिभेदाच्या उत्पत्तीच्या प्रश्नाचें प्राणिशास्त्रांतील प्राण्यांच्या जातीच्या उत्पत्तीच्या प्रश्नाशी फारच साम्य आहे. या पृथ्वीवर राहणाऱ्या प्राण्याच्या हजारों जाति कशा अस्तित्वांत आल्या असतील हा फार मनोरंजक प्रश्न आहे. त्याचप्रमाणे हिंदुसमाजांतही हजारों जाति कशा अस्तित्वांत आल्या असतील, हा प्रश्नही फार मनोरंजक आहे. प्राणिशास्त्रांतील जातिभेदाच्या उत्पत्तीच्या मीमांसेमध्यें तीन पायऱ्या दिसून येतात. तशाच तीन पायऱ्या हिंदुसमाजांतील जातिभेदाच्या उत्पत्तीच्या मीमांसेसंबंधींही दिसून येतात.<br>{{gap}}प्रत्येक प्राण्याचें एक एक जोडपें प्रथम उत्पन्न करून आपआपल्या जातीची प्रजा निर्माण करण्याची शक्ति या जोडप्यांना देवानें दिली आणि म्हणून प्रत्येक जातीचे गुणधर्म, आकाररूप वगैरे गोष्टी अगदीं न फिरणाऱ्या अशा आहेत. अशी या पृथ्वीवर<noinclude></noinclude> i9sdu6gy7zwcryetxtsc11wtrmmivd8 पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/१३४ 104 111196 233811 2026-07-28T10:04:21Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ 233811 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११५ 104 111197 233812 2026-07-28T10:07:24Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233812 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११०)}}</noinclude>दिसून येणाऱ्या लाखों प्राण्यांच्या उपपत्तीविषयीं पहिली कल्पना आहे. बायबलांत ही उपपत्ति दिली आहे. प्रत्येक धर्मांत अशीच उपपत्ति सांपडते. नोहाची होडी किंवा मनूची नौका अशासारख्या दंतकथा या उपपत्तीचे दाखले होत. पण पुढे जेव्हां प्राण्यांचें शास्त्रीयदृष्ट्या अवलोकन करून त्यावरून प्राणिशास्त्र बनविण्याचा प्रयत्न होऊं लागला तेव्हां ही धार्मिक उपपत्ति सयुक्तिक भासेनाशी झाली. शिवाय शास्त्रीय प्रयोगावरून व अवलोकनावरून असें दिसून येऊं लागलें कीं, प्राण्यांचे गुणधर्म व आकाररूप इत्यादि गोष्टी परिस्थित्यनुरूप बदलू शकतात. तेव्हां गुण किंवा स्वरूप ईश्वरदत्त कां मानावे? ते कांहीं स्वाभाविक कारणांपासून उत्पन्न झालें नाहीं कशावरून? प्राणिशास्त्राने हा प्रश्न उपस्थित केल्यापासून पहिली प्राणिभेदाची उपपत्ति समाधानकारक वाटेनाशी झाली व पहिल्या उपपत्तीचेच दुरुस्त केलेलें हें रूप समाधानकारक वाटूं लागलें. या उपपत्तीप्रमाणे तत्कालीन म्हणू लागले कीं, प्राण्यांच्या मुख्य जाति मात्र प्रत्यक्ष देवाने आपल्या सामर्थ्यानें उत्पन्न केल्या व त्यांस कांहीं सनातन धर्मगुण लावून दिले. पण पुढे ह्या मुख्य जातींपासून पुष्कळ उपजाती उत्पन्न झाल्या, त्या प्रत्यक्ष देवाने कल्या नाहींत तर त्या मात्र परिस्थितीच्या योगानें अस्तित्वांत आल्या. अर्थात् या उपजाति मात्र स्वाभाविक कारणांचा परिणामरूप होत व म्हणून या उपजातीची शास्त्रीय उपपत्ति करतां येते. पण मुख्यजातींची मात्र अशी उपपत्ति करणें शक्य नाहीं. कांहीं कालपर्यंत ही उपपत्ति मान्य झाली. तरीपण खऱ्या शास्त्रज्ञांचें या उपपत्तीने समाधान होईना, अर्वाचीन काळीं डार्विनने हा प्रश्न हातीं घेऊन सतत बारा वर्षे त्यानें त्याचा पिच्छा पुरविला व शेवटी प्राण्याच्या जातींच्या उत्पत्तीची उत्क्रांति नांवाची शास्त्रीय मीमांसा शोधून काढली. डार्विनच्या मतें जाति व उपजाति यामध्यें म्हणण्यासारखा दृढ भेद नाहीं.<noinclude></noinclude> 3o3hg2iab29qs9a3kfqzjhggdjfxgjm पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११६ 104 111198 233813 2026-07-28T10:10:03Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(१११)}}</noinclude>ज्या कारणांनी उपजाति उत्पन्न झाल्या त्याच कारणांच्या पुष्कळ दिवसाच्या योजनेनें जातिही उत्पन्न होऊं शकतील. सारांश, जातिभेदाची उपपत्ति देवी नसून शास्त्रीय किंवा स्वाभाविक आहे. एकाच समान धर्माच्या जीवतत्त्वापासून सर्व प्राण्यांच्या जातीची हळू हळू उत्क्रांत झालेली आहे. जीवनार्थकलह व स्वाभाविक निवड ह्या या उत्क्रांतीच्या प्रवर्तकशक्ति आहेत. ह्या दोन स्वाभाविक शक्तींनी प्राण्यांच्या हजारों जाति कालेकरून कशा निर्माण झाल्या, हें सप्रमाण सिद्ध करण्याचे काम डार्विननें केलें. यालाच त्याची उत्क्रांति मीमांसा म्हणतात.<br>{{gap}}हिंदुसमाजांतील जातिभेदाच्या उत्पत्तीच्या मीमांसेची हीच स्थिति आहे. हिच्याही तीन पायऱ्या आहेत असे दिसून येतें. हिंदुसमाजातील एखाद्या साध्याभोळ्या व जुन्या तऱ्हेच्या माणसास 'जातिभेद कसा झाला,' असे विचारल्यास तो चट्कन् उत्तर देईल कीं, जातिभेद मुळीं देवानेच उत्पन्न केला आहे. एखाद्या विशेष जातींत उत्पन्न होणे हे ज्याच्या त्याच्या नशिबावर अवलंबून आहे. पण एकंदर जातिभेद ही ईश्वरप्रणित संस्था आहे, ती स्वाभाविक मानवी कारणांनी उत्पन्न झालेली नाहीं. जातिभेदासंबंधी हा समज आमच्या समाजांत फार कालापासून आहे. या समजाचें उदाहरण अनपेक्षित तऱ्हेनें कालिदासाच्या अभिज्ञानशाकुंतल नाटकांत दिसून येतें. तेथें साहाव्या अंकांत नगररक्षक शिपाई व राजाची आंगठी सांपडलेला एक मासेमारी कोळी यांचा संवाद आलेला आहे. या संवादांत तो शिपाई कोळ्याच्या घाणेरड्या धंद्याबद्दल त्याची थट्टा करतो त्या वेळीं तो कोळी त्या शिपायास असें उत्तर देतो की, मनुष्याने "आपले स्वाभाविक काम कधींही टाकू नये." यावरून जातिभेदाच्या स्वाभाविकपणाची कल्पना समाजांत किती खोल गेलेली होती हें कळून येतें. या समजुतीमुळेच हिंदुसमाजांतील खालच्या जाति आपआपल्या जातींत मोठ्या आनंदानें राह-<noinclude></noinclude> 3igjizzpvif96bqzab0ji55qj3cpsbb पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११७ 104 111199 233814 2026-07-28T10:14:08Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233814 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११२)}}</noinclude>तात; व आपल्या कमदर्जाबद्दल त्यांना असमाधान वाटत नाहीं. जातिभेदाबद्दलच्या उपपत्तीची ही पहिली पायरी झाली.<br>{{gap}}हिंदुसमाजांतील जुन्या तऱ्हेनें शिकलेल्या लोकांना काय किंवा अर्वाचीन तऱ्हेनें शिकलेल्या लोकांना काय पुष्कळ वेळां असें वाटतें कीं, हिंदुसमाजांतील मुख्य चार जाति अगर चातुर्वर्ण्य ही व्यवस्था देवाने केलेली असून ती सनातन आहे, त्यांत बदल होणें शक्य नाहीं. चार वर्णांच्या चार हजार जाति झाल्या, त्या मात्र देवाने केलेल्या नाहींत, त्या मानवी किंवा सामाजिक कारणांनीं उत्पन्न झाल्या आहेत. वर्णसंकरामुळे, स्थलभेदामुळें, भाषाभेदामुळे, व्रात्यत्वामुळें किंवा अशाच दुसऱ्या परिस्थितीच्या भेदामुळे या चार हजार जाति अस्तित्वांत आलेल्या आहेत. या मानवी कारणांनीं उत्पन्न झालेल्या जाति नाहींशा करणें मानवी प्रयत्नाला शक्य आहे व कदाचित् इष्टही असूं शकेल. पण चातुर्वर्ण्य मात्र नाहींसें करणें शक्य नाहीं व इष्टही नाहीं. कारण ही व्यवस्था देवानें स्वतः उत्पन्न केली आहे, व या म्हणण्याला वेदांतील प्रसिद्ध पुरुषसूक्ताचा आधार आहे. ब्राह्मण या विराटपुरुषाचें मुख आहे. क्षत्रिय बाहु केलेला आहे. या पुरुषाच्या ज्या मांड्या आहेत त्या वैश्य होत. शूद्र या विराटपुरुषाच्या पायापासून उत्पन्न झालेले आहेत.' या अर्थाची पुरुषमूक्तांतील ऋचा या म्हणण्याच्या समर्थनार्थ नेहमीं सांगण्यांत येते. तसेच 'गुण आणि कर्म या भेदांवरून मी चार वर्ण उत्पन्न केले आहेत ' या अर्थाची श्रीमत्भगवद्गीतेंतील उक्ति या म्हणण्याचे प्रमाण म्हणून पुढें आणण्यांत येते. जातिभेदाची हीच उपपत्ति हिंदुसमाजांत सध्यां बहुजनसंमत आहे, असें म्हणणें वावगे नाहीं. पण शास्त्रीयदृष्ट्या ही उपपत्ति दुसऱ्या पायरीचीच आहे. याच्याही पुढें या उपपत्तीची पायरी आहे व तीच शेवटची व शास्त्रीय कसोटीला टिकणारी पायरी होय. ज्याप्रमाणे प्राणिशास्त्रांत उत्क्रांतितत्त्वाच्या अनुरोधानें ठरलेली प्राण्यांच्या निर-<noinclude></noinclude> k8iceej14geqclp8z74fpu13jgz201k पान:समाजशास्त्रावरील व्याख्याने.pdf/११८ 104 111200 233816 2026-07-28T10:23:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 233816 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{center|(११३)}}</noinclude>निराळ्या जातींच्या उत्पत्तीची मीमासा हीच शास्त्रीय कसोटीला उतरली व पहिल्या दोन पायऱ्या दंतकथात्मक ठरल्या. त्याप्रमाणेच येथें पहिल्या दोन कल्पना टाकाऊ ठरून हें उत्क्रांतितत्त्वच आधुनिक समाजशास्त्रज्ञांस मान्य झाले आहे.<br>{{gap}}हिंदुसमाजांतील जातिभेद व वर्णभेद हा एकरूपच आहे. ज्या कारणांनी जातिभेद उत्पन्न झालेला आहे त्याच कारणानीं वर्णभेद उत्पन्न झालेला आहे; व हीं कारणें दवी नसून मानवी किंवा सामाजिक आहेत. अर्थात् जातिभेद किंवा वर्णभेद हा मनुष्यकृत भेद आहे, ईश्वरकृत नाहीं. तो समाजाच्या कांहीं विशेष परिस्थितीनें उत्पन्न होतो; अर्थात् परिस्थिति व इतर सामाजिक कारणें बदलली तर तो भेदही बदलतो किंवा नाहींसा होतो. तेव्हां जातिभेद किंवा वर्णभेद सनातन आहे. हा मनुष्याच्या प्रयत्नांनीं बदलू शकणार नाहीं किंवा नाहींसा होणार नाहीं, या म्हणण्यांत कांहींएक अर्थ नाहीं. जशा समाजांतील इतर संस्था व चालीरीती या मनुष्यकृत आहेत आणि त्या जशा कालेकरून बदलत जातात किंवा नाहींशा होत जातात तीच स्थिति जातिभेदाची व वर्णभेदाची आहे. वर्णभेद व जातिभेद यांची ही उपपत्ति शास्त्रीय असून ती विचाराच्या कसोटीला टिकणारी आहे.<br>{{gap}}आतां ही उपपत्ति सिद्ध कशी करावयाची? आमच्या समाजांतील वर्णभेद व जातिभेद हा ईश्वरकृत आहे अशी सामान्य समजूत आहे.<br>{{gap}}हा समज खोडून काढावयाचा मार्ग म्हणजे, जातिभेद व वर्णभेद कसा अस्तित्वांत आला, याचें ऐतिहासिक विवेचन करणें हाच होय. जेथें हा समज निव्वळ अंधश्रद्धेवर अवलंबून आहे तेथें वादविवादाला जागाच नाहीं. पुरुषसूक्त हे देवाने दिलेले ज्ञान आहे किंवा भगवद्गीता ही देववाक्य आहे म्हणून आम्ही तें खरें मानणार, अशा मताच्या घटनेला<noinclude></noinclude> 9la7bxzse30qzwn1rujzce620xsm1lg सदस्य चर्चा:Sachresh16 3 111201 233817 2026-07-28T10:52:42Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 233817 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Sachresh16}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १६:२२, २८ जुलै २०२६ (IST) mds28d9tpwigp0c52ga9e1kbli0cszk