विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.16
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf
106
104089
235842
235802
2026-08-20T15:12:42Z
कल्पनाशक्ती
3813
235842
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=लंकेचें वर्णन व वृतांत
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
18ps1ylwez3adf42158wxzhgx0w3itu
235860
235842
2026-08-21T10:21:33Z
कल्पनाशक्ती
3813
235860
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=लंकेचें वर्णन व वृतांत
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
6l443yscpkfy5m8cab0hvhpyu4e410k
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१८
104
111669
235843
235822
2026-08-20T15:16:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235843
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१० |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मुळें त्याला राज्याधिकार हातांत घेण्यांत आनंद वाटला. भरतानें रामाच्या पश्चात् त्याच्या नांवानें उत्तम तऱ्हेनें राज्य चालविलें होतें. त्यानेही मोठ्या आनंदानें कारभाराची सूत्रे रामाच्या स्वाधीन केलीं. रामानें अयोध्येचें राज्य इतक्या उत्तम तऱ्हेनें व लोकांना सुख होईल अशा तऱ्हेने चालविलें कीं रामराज्य हा शब्द आदर्शभूत राज्यकारभाराचा द्योतक बनला.
{{gap}}अतिशयोक्ति, अद्भुतोक्ति व अवतारभावना यांच्या योगानें रामायणांत आलेले प्रक्षिप्त भाग सोडले तर रामरावणाची कथा थोडक्यांत वर लिहिल्याप्रमाणें सांगतां येते. पण दिलेल्या सारांशावरून कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो. रावण हा जरी राक्षस म्हणून वर्णिला आहे तरी रामायणांत बहुतेक ठिकाणी सामान्य पण धिप्पाड माणसासारखेंच त्याचें रूप होतें असें म्हटलेलें आहे. थोड्याच ठिकाणीं त्याला '''दशमुख''' म्हटलें आहे. हीं स्थळें प्रक्षिप्त तरी असावी किंवा दशमुख हा शब्द दुष्ट, लबाड, बहुरूपी अशा लाक्षणिक अर्थानें वापरलेला असावा. कारण प्राकृत भाषेंत '''बहुमुहो''' असा शब्द आहे. हा बहुमुख या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. '''बहुमुहो''' याचा प्राकृतांत दुष्ट, बहुरूपें धारण करणारा व म्हणून लबाड असा अर्थ आहे. तेव्हां दशमुख हा शब्दही दुष्ट, लबाड, अशा अर्थी रामायणांत वापरलेला असण्याचा संभव आहे. मात्र पुढे लोक त्याचा अक्षरशः अर्थ करूं लागले व म्हणून रावणाला दहा तोंडें व मंग अर्थात् वीस हात व वीस पाय होते अशी वेडगळ समजूत सर्वत्र पसरली.
{{gap}}रामायणावरून राम गोदावरी तीरावर रहात होते यांत शंका नाहीं व गोदावरी नदी तर विंध्य पर्वताच्या दक्षिणेस आहे. तेथून ते बराच लांबचा प्रवास करून किष्किंधा नगरीस गेले. अर्थात् किष्किंधा दंडकारण्याच्या पुष्कळ दक्षिणेस असली पाहिजे. म्हणजे ती तुंगभद्रा नदीच्या कांठाला असावी हें म्हणणें संयुक्तिक दिसतें. तेथून किती तरी लांबचा प्रवास करून रामलक्ष्मण व वानरांचे सैन्य दक्षिण समुद्राच्या तीरावर आलें. अर्थात् हल्लींच्या रामेश्वराच्या आसपास तें ठिकाण असावें हेंही रास्त<noinclude></noinclude>
6ti54hytgoh7mxpfwa2b32o0qnjfoyg
सदस्य चर्चा:सतीश परांजपे
3
111683
235841
2026-08-20T12:58:58Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
235841
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=सतीश परांजपे}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १८:२८, २० ऑगस्ट २०२६ (IST)
ofqqkoflna8nabmddmdmfmk0uny987m
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१९
104
111684
235844
2026-08-20T15:23:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235844
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकापुराणपरिचय|११}}</noinclude>दिसतें. लंकाबेट व त्यांतील लंकापुरी हीं त्या दक्षिण समुद्रांत होतीं ही गोष्ट रामायणांत स्पष्टपणें सांगितली आहे. लंकेच्या वर्णनपर श्लोकांतील खालील रावणोक्ति विचार करण्यासारखी आहे. "लंकानाम समुद्रस्य मध्ये मम महापुरी । सागरेण परिक्षिप्ता निविष्टा गिरिमूर्धनि ॥" अर्थात् लंका हें बेट होतें व त्यामध्ये डोंगरांनीं परिवेष्टित अशा पठारावर लंकानगरी होती असें वरील श्लोकावरून होतें. वरील उल्लेखावरून सध्यांचे सिंहलद्वीप म्हणजेच लंका बेट व त्या बेटाच्या मध्यभागी असलेल्या डोंगराळ प्रदेशाचे माथ्यावर रावणाची लंका होती असें म्हणण्यास हरकत नाहीं. तेव्हां हिंदुस्थानांत दलदलीच्या भागांत लंका होती किंवा दुसऱ्या कोणच्या तरी बेटांत लंका होती वगैरे शंका या कुशंका ठरतात व प्रचलित दंतकथा सत्याच्या पायावरच उभारलेल्या आहेत असें म्हणावें लागतें.
{{gap}}सर्व उत्तरकांड प्रक्षिप्त असल्यामुळें व लंकावर्णनाशीं त्याचा संबंध येत नसल्यामुळें त्याचा सारांश येथें दिला नाहीं. असो.
{{gap}}वाल्मीकि रामायणाच्या वरील सारांशावरून रामकथा ही किती सरळ, साधी व संभवनीय आहे हें दिसून येईल. म्हणून ही कथा ऐतिहासिक सत्य असावें व मूळच्या पायावर कविकल्पनेचे उंच उंच मनोरे उभारले असावे असे वाटल्या खेरीज रहात नाहीं. तेव्हां वास्तविकपणें पहातां राम हा अवतारी पुरुष नव्हता, किंवा तो लंकेवरील आर्यलोकांच्या स्वारीचा व वसाहतीचा नायक नव्हता; तर ज्याप्रमाणें अर्वाचीन काळीं लिव्हिंगस्टनने रानटी लोकांत जाऊन एकट्यानें सबंध आफ्रिकेचा शोध लावला त्याप्रमाणें रामलक्ष्मणांनीं सर्व दक्षिण हिंदुस्थान शोधलें व दक्षिण समुद्राच्या नजीक असलेल्या बेटावर ते गेले. अर्थात् हे अवघड काम करण्यास ते जे प्रवृत्त झाले ते लिव्हिंगस्टनप्रमाणें केवळ चौकस बुद्धीनें नव्हे तर आपल्या प्रिय माणसाचा शोध व सोडवणूक करून घेण्याच्या बुद्धीनें होय. यामुळें रामलक्ष्मणसीता यांना लंकेची विशेष माहिती झाली होती असें नाहीं व हिंदुस्थानांत परत आल्यावर लंकेशीं त्यांचा संबंध राहिला<noinclude></noinclude>
owtars4lgd1sirvyqjg4ob33io6bpux
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२०
104
111685
235845
2026-08-20T15:25:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235845
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>नाहीं. तेव्हां हिंदु लोकांनाही त्या काळीं लंकेची फारशी माहिती नव्हती. खुद्द लंकेंत रामाच्या कर्तबगारीबद्दलच्या दंतकथा थोड्या फार प्रचलित आहेत त्यांची माहिती लंकास्थलवर्णन प्रसंगी ओघाओघानें येईलच.
{{gap}}आतां पुढील प्रकरणांत पालीभाषेत लिहून ठेवलेल्या दंतकथांकडे वळूं या.

{{rule|5em}}{{rule|7em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
mt8c62napa47xvhgao06m9ytk6aavw1
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२१
104
111686
235846
2026-08-20T15:31:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235846
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण २ रें'''}}}}
{{rule|7em}}
{{center|{{x-larger|'''लंकेचा दंतकथात्मक इतिहास'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}{{x-larger|'''मा'''}}'''गील''' प्रकरणांत रामायणांतील मुख्य कथेचें विश्वसनीय सार सांगितलें. रामाच्या व वाल्मीकीच्या काळीं लंकेमध्ये आर्यांनीं वसाहत केली नव्हती किंवा आर्य प्रवासी स्वतः लंका पाहून आलेले नव्हते. राम- लक्ष्मण एवढेच आर्य दक्षिणेतील वानरतुल्य लोकांच्या साहाय्यानें लंकेस गेले व तेथें रावणाला मारून पण त्याचाच भाऊ बिभीषण याला लंकेच्या गादीवर बसवून सीतेला घेऊन ते परत आले. तेव्हां त्या काळीं आर्यांना लंकेची जी काय माहिती मिळाली असेल ती राम-लक्ष्मण-सीता या तीन व्यक्तींकडूनच मिळाली असली पाहिजे. अर्थात् ही माहिती लोकांना कर्णोपकर्णीच मिळणार हे उघड आहे. पुढे दीर्घ काळपर्यंत भारतवर्ष व लंका यांचा प्रत्यक्ष संबंध आला नाहीं. म्हणून लंकेंत रामाच्या स्वारीबद्दल व भारतवर्षामध्यें लंकेबद्दल कर्णोपकर्णी दंतकथाच काय त्या शिल्लक राहिल्या. सीतेच्या लंकेंतील वसतिस्थानाबद्दल व रावणाच्या लंकेंतील कारकीर्दीबद्दल व त्याच्या अलौकिक सामर्थ्याबद्दलच्या दंतकथा अजून लंकेमध्यें प्रचलित आहेत. पण आर्याची कायमची वसाहत त्या काळीं तेथें न झाल्यामुळे या रामाच्या स्वारीचा लंकेच्या वाङ्मयांत कोठेंच उल्लेख नाहीं. कारण लंकेतील पाली भाषेतील काय किंवा सिंहली भाषेतील काय सर्व वाङ्मय बौद्धकालीन व त्यानंतरचें आहे, त्या वाङ्मयामध्ये, '''महावंस''' व '''xxxx'''नांवाचे दोन अद्वितीय ऐतिहासिक ग्रंथ झालेले होते. ते xx xx भाषेत व भाषांतरद्वारा इंग्रजी भाषेमध्ये छापले गेले आहेत. दोन ग्रंथ निरनिराळ्या काळीं व निरनिराळ्या लेखकांच्या हस्ते तयार झालेले असले तरी त्या ग्रंथांमध्यें लंकेचा बुद्धनिर्वाण कालापासून तो थेट ब्रिटिश लोकांनी लंकेचा<noinclude></noinclude>
40bzcms1kby0cc63kbfkrlf68c78ziv
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२२
104
111687
235847
2026-08-20T15:31:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ताबा घेईपर्यंतच्या कालाचा व सर्व राजवटींचा सविस्तर, संगतवार, सनवार व सलग असा इतिहास गोवलेला आहे. म्हणून हे दोन्ही ग्रंथ खरोखरीं वस्तुतः एकच आहेत व एकाच नांवानें पुष्कळ वेळां त्य..."
235847
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>ताबा घेईपर्यंतच्या कालाचा व सर्व राजवटींचा सविस्तर, संगतवार, सनवार व सलग असा इतिहास गोवलेला आहे. म्हणून हे दोन्ही ग्रंथ खरोखरीं वस्तुतः एकच आहेत व एकाच नांवानें पुष्कळ वेळां त्यांचा उल्लेख केला जातो. महावंस भाग पहिला व महावंस भाग दुसरा असे त्याचे कालक्रमानें दोन भाग साहजिक पडले आहेत.
महावंस भाग पहिला हा ग्रंथ लंकेच्या राजघराण्यांतील एका राजभक्त, देशभक्त, भाविक पण चौकसबुद्धीच्या महानाम नांवाच्या बुद्धभिक्षूनें इसवी सनाच्या पांचव्या शतकांत जुन्या कागदपत्रांवरून माहिती मिळवून लिहिला. त्यांत क्रिस्तपूर्व सन ५०० पासून इ. स. ३०० पर्यंत म्हणजे सुमारे ८०० वर्षांच्या काळाचा इतिहास महासेन राजाच्या कारकीर्दीच्या अखेरपर्यंत गोविलेला आहे. महावंस याच्या पहिल्या भागाचें ग्रंथ- कर्त्याच्या नांवावरून 'महानाम' असेही दुसरें नांव प्रचलित आहे. महा- वंसाचा दुसरा भाग मात्र वेळोवेळीं व निरनिराळ्या लेखकांकडून लिहिला गेला आहे. ज्याप्रमाणें काश्मीरच्या इतिहासाला विश्वसनीय व आधार- भूत असा एकच 'राजतरंगिणी' हा ग्रंथ आहे त्याप्रमाणेंच लंकेच्या इतिहासाला महावंस हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ बौद्धधर्मी भिक्षूंनी बौद्ध धर्माची महती गाण्याकरितां व बौद्धधर्माकरितां ज्या राजांनीं विशेष कामगिरी केली त्यांची सविस्तर हकीकत देण्याकरितां लिहिला आहे. त्यामुळे त्यामध्यें अतिशयोक्ति व असत्योक्ति असली तरी ती नारळाची करटी व चोड यांच्याप्रमाणें थोड्या प्रयासानें काढून टाकतां येण्यासारखी असून आंत नारळाच्या गोड व चवस खोबऱ्याप्रमाणें सत्याचा गाभा पुष्कळच आहे असें आतां निर्विवाद सिद्ध झालें आहे.
ज्याप्रमाणे पहिल्या प्रकरणांत वाल्मीकिरामायण सागरांत बुडया मारून एक विश्वसनीय कथारत्न वाचकांस सादर केलें, त्याप्रमाणें या मोठ्या महावंस ग्रंथाच्या दंतकथात्मक इतिहासरूपी सागरांत बुड्या मारून विश्वसनीय व मनोरंजक कथारत्ने वाचकांस नजर करण्याचा बेत आहे.<noinclude></noinclude>
42m3mgckce5h6chamlpmf922nh5ity5
235854
235847
2026-08-21T09:55:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235854
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>ताबा घेईपर्यंतच्या कालाचा व सर्व राजवटींचा सविस्तर, संगतवार, सनवार व सलग असा इतिहास गोवलेला आहे. म्हणून हे दोन्ही ग्रंथ खरोखरीं वस्तुतः एकच आहेत व एकाच नांवानें पुष्कळ वेळां त्यांचा उल्लेख केला जातो. '''महावंस''' भाग पहिला व '''महावंस''' भाग दुसरा असे त्याचे कालक्रमानें दोन भाग साहजिक पडले आहेत.
{{gap}}महावंस भाग पहिला हा ग्रंथ लंकेच्या राजघराण्यांतील एका राजभक्त, देशभक्त, भाविक पण चौकसबुद्धीच्या महानाम नांवाच्या बुद्धभिक्षूनें इसवी सनाच्या पांचव्या शतकांत जुन्या कागदपत्रांवरून माहिती मिळवून लिहिला. त्यांत क्रिस्तपूर्व सन ५०० पासून इ. स. ३०० पर्यंत म्हणजे सुमारे ८०० वर्षांच्या काळाचा इतिहास महासेन राजाच्या कारकीर्दीच्या अखेरपर्यंत गोविलेला आहे. महावंस याच्या पहिल्या भागाचें ग्रंथकर्त्याच्या नांवावरून 'महानाम' असेही दुसरें नांव प्रचलित आहे. महावंसाचा दुसरा भाग मात्र वेळोवेळीं व निरनिराळ्या लेखकांकडून लिहिला गेला आहे. ज्याप्रमाणें काश्मीरच्या इतिहासाला विश्वसनीय व आधारभूत असा एकच 'राजतरंगिणी' हा ग्रंथ आहे त्याप्रमाणेंच लंकेच्या इतिहासाला '''महावंस''' हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ बौद्धधर्मी भिक्षूंनी बौद्ध धर्माची महती गाण्याकरितां व बौद्धधर्माकरितां ज्या राजांनीं विशेष कामगिरी केली त्यांची सविस्तर हकीकत देण्याकरितां लिहिला आहे. त्यामुळे त्यामध्यें अतिशयोक्ति व असत्योक्ति असली तरी ती नारळाची करटी व चोड यांच्याप्रमाणें थोड्या प्रयासानें काढून टाकतां येण्यासारखी असून आंत नारळाच्या गोड व चवस खोबऱ्याप्रमाणें सत्याचा गाभा पुष्कळच आहे असें आतां निर्विवाद सिद्ध झालें आहे.
{{gap}}ज्याप्रमाणे पहिल्या प्रकरणांत वाल्मीकिरामायण सागरांत बुड्या मारून एक विश्वसनीय कथारत्न वाचकांस सादर केलें, त्याप्रमाणें या मोठ्या महावंस ग्रंथाच्या दंतकथात्मक इतिहासरूपी सागरांत बुड्या मारून विश्वसनीय व मनोरंजक कथारत्ने वाचकांस नजर करण्याचा बेत आहे.{{nop}}<noinclude></noinclude>
gy0q5c7sl9iq6y7z8nksm091rxvixau
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२३
104
111688
235848
2026-08-20T15:31:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "वंगदेशाचा विजय नांवाचा राजकुमार हा लंकेवर स्वारी करून तेथें आर्याचें राज्य स्थापन करणारा पहिला क्षत्रिय राजा होय. या राज- कुमाराच्या बापाच्या विलक्षण जन्मकथेपासून महावंसाच्य..."
235848
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|१५ }}</noinclude>वंगदेशाचा विजय नांवाचा राजकुमार हा लंकेवर स्वारी करून तेथें आर्याचें राज्य स्थापन करणारा पहिला क्षत्रिय राजा होय. या राज- कुमाराच्या बापाच्या विलक्षण जन्मकथेपासून महावंसाच्या ऐतिहासिक हकीकतीस सुरवात झाली आहे. ती कथा रोमचा प्रस्थापक रॉम्युलस याच्या दंतकथेपेक्षां जास्त आश्चर्यकारक व जास्त असंभवनीय वाटली. तरी त्याच पंखीं आहे हें खरें. ती दंतकथा अशी.
वंग देशाच्या राजाचा कलिंग देशाच्या राजकन्येशी विवाह झाला.. या जोडप्याला सुप्पा देवी नांवाची एक लावण्यवती कन्या झाली. पण तिच्या नशिबीं वनराजसंयोग आहे असें तिच्या जन्मपत्रिकेवरून भविष्य करण्यांत आलें. या कन्येला खरोखरीच रानावनांत हिंडण्याचा नाद लागला. ती एका व्यापारी तांड्याबरोबर अरण्यांत गेली असतां एका सिंहानें त्या तांड्यावर हल्ला केला; पण सुप्पादेवीला पाहिल्याबरोबर सिंह तिच्याशीं लांगूलचालन करूं लागला. तिनें सिंहाच्या पाठीवर हात फिरवून त्याला कुरवाळलें. सिंहानें तिला पाठीवर घेतलें व आपल्या गु नेलें. त्या सिंहापासून सुप्पा देवीला सिंहवाहु नांवाचा एक मुलगा व सिंहशिवळी नांवाची एक मुलगी अशीं जुळीं मुलें झाली. सिंहबाहू सोळा वर्षांचा झाल्यावर व त्याला समजूं लागल्यावर त्यानें आपल्या आईला आपला बाप इतका विलक्षण कां असें विचारलें. तेव्हां तिनें आपल्या जन्माबद्दल, जन्मपत्रिकेतील भविष्याबद्दल व वनराज - संयोगाबद्दल खरी हकीकत सांगितली. ती ऐकून सिंह गुहेबाहेर गेला असतां, सिंहबाहु आपल्या आईस एका खांद्यावर व आपल्या बहिणीस दुसऱ्या खांद्यावर घेऊन गुहेच्या बाहेर जाऊन दूरच्या एका रानांत झोपडें करून राहिला. तेथें वंग देशाच्या राजाचा सेनापती शिकारीकरितां आला होता. त्यानें या त्रिवर्गीस पाहून त्यांची चवकशी केली व त्यांना घेऊन तो नगरास गेला. इकडे सिंह गुर्हेत परत येतो तों त्रिवर्ग पसार झालेले. तेव्हां त्याला फार दुःख झालें व तो सिंह खेडोखेडीं जाऊन त्यांचा शोध करूं लागला. खेड्यांतील लोक सिंहाला भिऊन राजाकडे दाद मागावयास आले. राजानें त्या सिंहाला<noinclude></noinclude>
t9qjvm27b9wif5wvhgbkbufa9jbekyv
235855
235848
2026-08-21T09:59:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235855
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|१५ }}</noinclude>{{gap}}वंगदेशाचा विजय नांवाचा राजकुमार हा लंकेवर स्वारी करून तेथें आर्याचें राज्य स्थापन करणारा पहिला क्षत्रिय राजा होय. या राजकुमाराच्या बापाच्या विलक्षण जन्मकथेपासून महावंसाच्या ऐतिहासिक हकीकतीस सुरवात झाली आहे. ती कथा रोमचा प्रस्थापक रॉम्युलस याच्या दंतकथेपेक्षां जास्त आश्चर्यकारक व जास्त असंभवनीय वाटली. तरी त्याच पंखीं आहे हें खरें. ती दंतकथा अशी.
{{gap}}वंग देशाच्या राजाचा कलिंग देशाच्या राजकन्येशी विवाह झाला. या जोडप्याला '''सुप्पा देवी''' नांवाची एक लावण्यवती कन्या झाली. पण तिच्या नशिबीं वनराजसंयोग आहे असें तिच्या जन्मपत्रिकेवरून भविष्य करण्यांत आलें. या कन्येला खरोखरीच रानावनांत हिंडण्याचा नाद लागला. ती एका व्यापारी तांड्याबरोबर अरण्यांत गेली असतां एका सिंहानें त्या तांड्यावर हल्ला केला; पण सुप्पादेवीला पाहिल्याबरोबर सिंह तिच्याशीं लांगूलचालन करूं लागला. तिनें सिंहाच्या पाठीवर हात फिरवून त्याला कुरवाळलें. सिंहानें तिला पाठीवर घेतलें व आपल्या गुहेत नेलें. त्या सिंहापासून सुप्पा देवीला '''सिंहबाहु''' नांवाचा एक मुलगा व '''सिंहशिवळी''' नांवाची एक मुलगी अशीं जुळीं मुलें झाली. सिंहबाहू सोळा वर्षांचा झाल्यावर व त्याला समजूं लागल्यावर त्यानें आपल्या आईला आपला बाप इतका विलक्षण कां असें विचारलें. तेव्हां तिनें आपल्या जन्माबद्दल, जन्मपत्रिकेतील भविष्याबद्दल व वनराज-संयोगाबद्दल खरी हकीकत सांगितली. ती ऐकून सिंह गुहेबाहेर गेला असतां, सिंहबाहु आपल्या आईस एका खांद्यावर व आपल्या बहिणीस दुसऱ्या खांद्यावर घेऊन गुहेच्या बाहेर जाऊन दूरच्या एका रानांत झोपडें करून राहिला. तेथें वंग देशाच्या राजाचा सेनापती शिकारीकरितां आला होता. त्यानें या त्रिवर्गीस पाहून त्यांची चवकशी केली व त्यांना घेऊन तो नगरास गेला. इकडे सिंह गुहेत परत येतो तो त्रिवर्ग पसार झालेले. तेव्हां त्याला फार दुःख झालें व तो सिंह खेडोखेडीं जाऊन त्यांचा शोध करूं लागला. खेड्यांतील लोक सिंहाला भिऊन राजाकडे दाद मागावयास आले. राजानें त्या सिंहाला<noinclude></noinclude>
7lltmwiukhet7e2i1cj7fz5bl007oz6
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२४
104
111689
235849
2026-08-20T15:31:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मारून त्याचे डोके आणून देणारास मोठें बक्षीस देऊ केलें तें बक्षीस आईचं न ऐकतां सिंहवाहूनें घेतलें. मग त्यानें त्य सिंहाला गांडून त्याला मारून त्याचें डोकें नगरांत राजवाड्यां आण..."
235849
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मारून त्याचे डोके आणून देणारास मोठें बक्षीस देऊ केलें तें बक्षीस आईचं न ऐकतां सिंहवाहूनें घेतलें. मग त्यानें त्य सिंहाला गांडून त्याला मारून त्याचें डोकें नगरांत राजवाड्यां आणून दिलें. इतक्यांत राजा वारला. तेव्हां सेनापतीला सिंहबाहूची व · त्याच्या आईची खरी खरी हकीकत ठाऊक होती, म्हणून त्याने सर्व सरदारांची समजूत घालून सिंहबाहूला वंग देशाचें राज्य दिलें. सिंह वाहु हा पराक्रमी असून राजाचा नातूच आहे असें कळल्यामुळे लोकांन आनंद वाटला.
या सिंहबाहूला विजयासकट दहा मुलगे झाले. पण विजय लहान- पणापासून खोडकर व बापाच्या मनाविरुद्ध वागणारा निघाला. तो आपल्यासारखे तरुण सोबती व संवगडे जमवून हवा तसा दंगाधोपा करूं लागला. म्हणून राजानें त्या सर्वांना होड्यांत बसवून समुद्रांतून देशाबाहेर पाठविलें. विजय राजकुमार आपल्या सातशें संवगड्यांसकट लंकाबेटास आला व तेथें त्यानें कायमचें ठाणें दिलें. लंकेंत त्यावेळी यक्षांचे राज्य होतें. त्या यक्षजातीपैकी कुवेणू नांवाच्या यक्षिणीनें विजयाचे सर्व संवगडे सरोवरांत बुडविले. राजा त्यांच्या शोधार्थ सरो- वराशीं आला असतां त्यानें त्या कुवेणूला झाडाखालीं सूत काढीत बसलेली पाहिली. याच चेटकिणीनें आपले संवगडे मारले असले पाहिजेत असे वाटून तो रागानें तिच्या अंगावर धांवून गेला व त्यानें तिला मारण्याचा चाक घातला. " मला आपली स्त्री करशील तर तुझे संवगडे परत देतें व तुला येथला राजाही करतें ", असें कुवेणू म्हणाली. तेव्हां विजयानें तिला सोडलें. मग तिनें सरोवरांतून त्या संवगड्यांना जिवंत काढून विजयाचे स्वाधीन केलें. रात्रीं वायें वाजतांना विजयानें ऐकलें. तेव्हां कुवेणू म्हणाली, "आज रात्रीं यक्षनगरीत मोठा विवाह समारंभ चालू आहे; तेथे सर्व यक्ष जमले आहेत व त्यांचा राजा कालसेनही तेथेंच आहे. त्या सर्वांना मारण्याची ही वेळ आहे. तरी मी सांगतें त्या युक्तीनें तूं त्यांचा संहार कर म्हणजे सर्व लंकेचा राजा होशील. " विज-<noinclude></noinclude>
to9j66vfh874aagojpccnscszpvmi7r
235856
235849
2026-08-21T10:03:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235856
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मारून त्याचे डोके आणून देणारास मोठें बक्षीस देऊ केलें तें बक्षीस आईचे न ऐकतां सिंहबाहूनें घेतलें. मग त्यानें त्या सिंहाला गाठून त्याला मारून त्याचें डोकें नगरांत राजवाड्यांत आणून दिलें. इतक्यांत राजा वारला. तेव्हां सेनापतीला सिंहबाहूची व त्याच्या आईची खरी खरी हकीकत ठाऊक होती, म्हणून त्याने सर्व सरदारांची समजूत घालून सिंहबाहूला वंग देशाचें राज्य दिलें. सिंहबाहु हा पराक्रमी असून राजाचा नातूच आहे असें कळल्यामुळे लोकांन आनंद वाटला.
{{gap}}या सिंहबाहूला विजयासकट दहा मुलगे झाले. पण विजय लहानपणापासून खोडकर व बापाच्या मनाविरुद्ध वागणारा निघाला. तो आपल्यासारखे तरुण सोबती व संवगडे जमवून हवा तसा दंगाधोपा करूं लागला. म्हणून राजानें त्या सर्वांना होड्यांत बसवून समुद्रांतून देशाबाहेर पाठविलें. विजय राजकुमार आपल्या सातशें संवगड्यांसकट लंकाबेटास आला व तेथें त्यानें कायमचें ठाणें दिलें. लंकेंत त्यावेळी यक्षांचे राज्य होतें. त्या यक्षजातीपैकी '''कुवेणू''' नांवाच्या यक्षिणीनें विजयाचे सर्व संवगडे सरोवरांत बुडविले. राजा त्यांच्या शोधार्थ सरोवराशीं आला असतां त्यानें त्या '''कुवेणूला''' झाडाखालीं सूत काढीत बसलेली पाहिली. याच चेटकिणीनें आपले संवगडे मारले असले पाहिजेत असे वाटून तो रागानें तिच्या अंगावर धांवून गेला व त्यानें तिला मारण्याचा धाक घातला. "मला आपली स्त्री करशील तर तुझे संवगडे परत देतें व तुला येथला राजाही करतें", असें कुवेणू म्हणाली. तेव्हां विजयानें तिला सोडलें. मग तिनें सरोवरांतून त्या संवगड्यांना जिवंत काढून विजयाचे स्वाधीन केलें. रात्रीं वाद्यें वाजतांना विजयानें ऐकलें. तेव्हां कुवेणू म्हणाली, "आज रात्रीं यक्षनगरीत मोठा विवाह समारंभ चालू आहे; तेथे सर्व यक्ष जमले आहेत व त्यांचा राजा कालसेनही तेथेंच आहे. त्या सर्वांना मारण्याची ही वेळ आहे. तरी मी सांगतें त्या युक्तीनें तूं त्यांचा संहार कर म्हणजे सर्व लंकेचा राजा होशील." विज-<noinclude></noinclude>
8apu35vamy7i6e4b1qss0fsz9dtuai6
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२५
104
111690
235850
2026-08-20T15:32:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "यानें कुवेणूच्या सल्ल्याप्रमाणें राजासकट सर्व यक्षांना मारून आपण कालसेनाचा पोशाख अंगावर घातला व आपल्या संवगड्यांना इतर यक्ष सरदारांचा वेष दिला. या प्रमाणें विजय हा लंकेचा पहि..."
235850
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|१७ }}</noinclude>यानें कुवेणूच्या सल्ल्याप्रमाणें राजासकट सर्व यक्षांना मारून आपण कालसेनाचा पोशाख अंगावर घातला व आपल्या संवगड्यांना इतर यक्ष सरदारांचा वेष दिला. या प्रमाणें विजय हा लंकेचा पहिला आर्य राजा झाला. त्यानें ताम्रपर्णी नांवाची आपली राजधानी वसविली. त्याचे संवगडे सरदार झाले; व त्यांनीही दुसरी शहरें वसविली. याप्रमाणे कायमचें राज्य स्थापन केल्यावर विजयाला राज्याभिषेक करण्याचें ठरलें. परंतु राजघराण्यांतील विवाहित राणीखेरीज राजानें राज्याभिषेक करून घेण्याचें नाकारिलें. तेव्हां प्रधान मंडळींनीं मदुरेच्या पांडव नांवाच्या राजाच्या राजकन्येला मागणी घातली व इतर सरदारांनी स्त्रियांकरितां आणखी पुष्कळ मुलींना मागण्या घातल्या. मदुरेच्या राजानें आपली कन्या विजयास देण्याकरितां व इतर मुली सरदारांस देण्याकरितां सर्व मंडळींना नजराण्यासकट पाठवून दिलें. नंतर विजयाचा व इतर सर- दारांचे विवाह झाले. याप्रमाणें लंकेत आर्याची मोठी वसाहत व राज्य सुरूं झालें. विजय राजकुमार आपल्या संवगड्यांसह बुद्धाच्या निर्वाण- वर्षी म्हणजे अर्वाचीन शोधाप्रमाणे क्रिस्तपूर्व ४८३ या वर्षी लंकेत आला. लंकेमध्यें या बुद्ध-निर्वाणापासूनच कालगणना सुरू झाली व ती एकसारखी ब्रिटिश अंमलापर्यंत सुरू राहिली. म्हणूनच महा- वसांतील राजावळीची व इतिहासाची परंपरा सारखी व विश्वसनीय राहूं शकली. हिंदुस्थानाप्रमाणें निरनिराळे शककाल व त्यांनीं उत्पन्न केलेला घोंटाळा व संदेह लंकेच्या ऐतिहासिक वाङ्मयांत मुळींच दिसून येत नाहीं. असो.
विजयाची हकीकत जरा विस्तारानें सांगितली. कारण तो लंकेचा पहिला राजा होय. व दुसरें कारण महावंस हा किती सविस्तरपणें लिहिलेला ग्रंथ आहे याची कल्पना वाचकांस यावी.
दोन्ही भाग मिळून महावंसांत एकंदर सुमारे पावणे दोनशें राजांची थोडीफार हकीकत दिलेली आहे त्यांपैकी सुमारे शंभर राजांची अनुराद्ध- पूर ही राजधानी होती. सुमारें पसतीस राजांची पोलनुरूवा ही राजधानी<noinclude></noinclude>
rxyrgcp2t6fxyaj8xu099k88zke9cqn
235857
235850
2026-08-21T10:07:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235857
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|१७ }}</noinclude>यानें कुवेणूच्या सल्ल्याप्रमाणें राजासकट सर्व यक्षांना मारून आपण कालसेनाचा पोशाख अंगावर घातला व आपल्या संवगड्यांना इतर यक्ष सरदारांचा वेष दिला. या प्रमाणें विजय हा लंकेचा पहिला आर्य राजा झाला. त्यानें ताम्रपर्णी नांवाची आपली राजधानी वसविली. त्याचे संवगडे सरदार झाले; व त्यांनीही दुसरी शहरें वसविली. याप्रमाणे कायमचें राज्य स्थापन केल्यावर विजयाला राज्याभिषेक करण्याचें ठरलें. परंतु राजघराण्यांतील विवाहित राणीखेरीज राजानें राज्याभिषेक करून घेण्याचें नाकारिलें. तेव्हां प्रधान मंडळींनीं मदुरेच्या पांडव नांवाच्या राजाच्या राजकन्येला मागणी घातली व इतर सरदारांनी स्त्रियांकरितां आणखी पुष्कळ मुलींना मागण्या घातल्या. मदुरेच्या राजानें आपली कन्या विजयास देण्याकरितां व इतर मुली सरदारांस देण्याकरितां सर्व मंडळींना नजराण्यासकट पाठवून दिलें. नंतर विजयाचा व इतर सरदारांचे विवाह झाले. याप्रमाणें लंकेत आर्याची मोठी वसाहत व राज्य सुरूं झालें. विजय राजकुमार आपल्या संवगड्यांसह बुद्धाच्या निर्वाण-वर्षी म्हणजे अर्वाचीन शोधाप्रमाणे क्रिस्तपूर्व ४८३ या वर्षी लंकेत आला. लंकेमध्यें या बुद्ध-निर्वाणापासूनच कालगणना सुरू झाली व ती एकसारखी ब्रिटिश अंमलापर्यंत सुरू राहिली. म्हणूनच महावंसांतील राजावळीची व इतिहासाची परंपरा सारखी व विश्वसनीय राहूं शकली. हिंदुस्थानाप्रमाणें निरनिराळे शककाल व त्यांनीं उत्पन्न केलेला घोंटाळा व संदेह लंकेच्या ऐतिहासिक वाङ्मयांत मुळींच दिसून येत नाहीं. असो.
{{gap}}विजयाची हकीकत जरा विस्तारानें सांगितली. कारण तो लंकेचा पहिला राजा होय. व दुसरें कारण महावंस हा किती सविस्तरपणें लिहिलेला ग्रंथ आहे याची कल्पना वाचकांस यावी.
{{gap}}दोन्ही भाग मिळून महावंसांत एकंदर सुमारे पावणे दोनशें राजांची थोडीफार हकीकत दिलेली आहे त्यांपैकी सुमारे शंभर राजांची अनुराद्धपूर ही राजधानी होती. सुमारें पसतीस राजांची पोलनुरूवा ही राजधानी<noinclude></noinclude>
6ejymppmbmo1sruo9iot08zwmb7vxmx
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२६
104
111691
235851
2026-08-20T15:32:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "होती व शेवटच्या दहा राजांची कँडी ही राजधानी होती. लंकेतील दुसऱ्या दुय्यम दर्जाच्या शहरांना राजधानीचा मान थोडा काळ मिळाला होता; पण त्या केव्हांही कायमच्या किंवा बहुतकाळच्या राज-..."
235851
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>होती व शेवटच्या दहा राजांची कँडी ही राजधानी होती. लंकेतील दुसऱ्या दुय्यम दर्जाच्या शहरांना राजधानीचा मान थोडा काळ मिळाला होता; पण त्या केव्हांही कायमच्या किंवा बहुतकाळच्या राज- धान्या झाल्या नाहींत. आपसांतील राजघराण्यांच्या तंट्यामुळें किंवा पर- चक्राच्या भयानें कित्येक राजांनीं आपल्या कायमच्या राजधान्या सोडून दुसऱ्या दुर्गम दुर्गाचा किंवा दूरच्या शहरांचा कांहीं काळ आश्रय केला व म्हणून त्या ठिकाणांना तात्पुरतें राजधानीपद प्राप्त झाले इतकेंच. विजयापासून शेवटच्या श्री विक्रम राजसिंहापर्यंत लोटलेल्या सुमारें तेवीसशे वर्षांच्या काळाचा हा इतिहास ग्रंथ आहे. तेव्हां असा ऐतिहासिक ग्रंथ जगांतील कोणत्याही वाङ्मयांत उपलब्ध नाहीं हें उघड होतें. असा अद्वितीय ग्रंथ लंकेला लाभलेला आहे व त्यावरून लंकेच्या उत्कर्षाप कर्षाची उत्तम कल्पना मनांत येते, ही निर्विवाद गोष्ट आहे. तेव्हां येवढ्या मोठ्या ग्रंथांतून ठळक ठळक कारकीर्दीची केवळ रूपरेखा देण्या- खेरीज गत्यंतर नाहीं.
विजयाला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या पश्चात् त्याचा भाऊ पंडुवास याला वंग देशांतून आणून लंकेच्या राज्यावर बसविलें. त्यानें शाक्य राजघराण्यांतील राजकन्येशी विवाह केला. त्या दांपत्याला दहा मुलगे व एक सीता नांवाची मुलगी झाली. या मुलीचा मुलगा आपल्या सर्व मामांना मार्गे सारून राज्य बळकावील असें भविष्य केलें असल्यामुळें तिला मारून टाकावी असा सल्ला भावांनी दिला. पण राजानें तिला फक्त नजर कैदेत ठेवलें. तरी पण तिच्यावर तिच्या चुलतभावाचें (वंग देशच्या राजपुत्राचें ) प्रेम जडलें. मुलगा झाल्यावर मारून टाकण्याचें कबूल केल्यावर तिचें त्या राजकुमाराशीं लग्न लावून देण्यांत आलें. सीतेला पुत्र झाला, पण त्याला त्याच वेळीं बाळंत झालेल्या एका बाईचे स्वाधीन करून तिची मुलगी राजकन्येनें बाळगली. पण हा मुलगा मोठा झाल्यावर त्यानें आपल्या मामांस मारिलें व तो लंकेचा राजा झाला. त्याचें नांव पंडुकाभय. हा लंकेचा अत्यंत कर्तृत्ववान् व मोठा राजकार्यधुरंधर<noinclude></noinclude>
nz3xk0k9puoybsgkivv659949y6fc3a
235858
235851
2026-08-21T10:11:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235858
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>होती व शेवटच्या दहा राजांची कँडी ही राजधानी होती. लंकेतील दुसऱ्या दुय्यम दर्जाच्या शहरांना राजधानीचा मान थोडा काळ मिळाला होता; पण त्या केव्हांही कायमच्या किंवा बहुतकाळच्या राजधान्या झाल्या नाहींत. आपसांतील राजघराण्यांच्या तंट्यामुळें किंवा परचक्राच्या भयानें कित्येक राजांनीं आपल्या कायमच्या राजधान्या सोडून दुसऱ्या दुर्गम दुर्गाचा किंवा दूरच्या शहरांचा कांहीं काळ आश्रय केला व म्हणून त्या ठिकाणांना तात्पुरतें राजधानीपद प्राप्त झाले इतकेंच. विजयापासून शेवटच्या श्री विक्रम राजसिंहापर्यंत लोटलेल्या सुमारें तेवीसशे वर्षांच्या काळाचा हा इतिहास ग्रंथ आहे. तेव्हां असा ऐतिहासिक ग्रंथ जगांतील कोणत्याही वाङ्मयांत उपलब्ध नाहीं हें उघड होतें. असा अद्वितीय ग्रंथ लंकेला लाभलेला आहे व त्यावरून लंकेच्या उत्कर्षापकर्षाची उत्तम कल्पना मनांत येते, ही निर्विवाद गोष्ट आहे. तेव्हां येवढ्या मोठ्या ग्रंथांतून ठळक ठळक कारकीर्दीची केवळ रूपरेखा देण्याखेरीज गत्यंतर नाहीं.
{{gap}}विजयाला पुत्र नव्हता म्हणून त्याच्या पश्चात् त्याचा भाऊ '''पंडुवास''' याला वंग देशांतून आणून लंकेच्या राज्यावर बसविलें. त्यानें शाक्य राजघराण्यांतील राजकन्येशी विवाह केला. त्या दांपत्याला दहा मुलगे व एक '''सीता''' नांवाची मुलगी झाली. या मुलीचा मुलगा आपल्या सर्व मामांना मागे सारून राज्य बळकावील असें भविष्य केलें असल्यामुळें तिला मारून टाकावी असा सल्ला भावांनी दिला. पण राजानें तिला फक्त नजर कैदेत ठेवलें. तरी पण तिच्यावर तिच्या चुलतभावाचें (वंग देशच्या राजपुत्राचें) प्रेम जडलें. मुलगा झाल्यावर मारून टाकण्याचें कबूल केल्यावर तिचें त्या राजकुमाराशीं लग्न लावून देण्यांत आलें. सीतेला पुत्र झाला, पण त्याला त्याच वेळीं बाळंत झालेल्या एका बाईचे स्वाधीन करून तिची मुलगी राजकन्येनें बाळगली. पण हा मुलगा मोठा झाल्यावर त्यानें आपल्या मामांस मारिलें व तो लंकेचा राजा झाला. त्याचें नांव '''पंडुकाभय'''. हा लंकेचा अत्यंत कर्तृत्ववान् व मोठा राजकार्यधुरंधर<noinclude></noinclude>
fnx061emse3mqbnl8yz7lo7mfhj2sbo
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२७
104
111692
235852
2026-08-20T15:32:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "असा राजा होय. त्यानेंच प्रथम अनुराद्धपुर येथे राजधानी स्थापन करून मोठमोठ्या इमारती बांधण्यास सुरवात केली. त्यानें राज्यही खूप काळ केले. त्यांमुळे त्या राज्याला स्थैर्य व बळकटी..."
235852
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|१९ }}</noinclude>असा राजा होय. त्यानेंच प्रथम अनुराद्धपुर येथे राजधानी स्थापन करून मोठमोठ्या इमारती बांधण्यास सुरवात केली. त्यानें राज्यही खूप काळ केले. त्यांमुळे त्या राज्याला स्थैर्य व बळकटी आली.
पंडुकाभयाच्यापेक्षांही लंकेच्या इतिहासांतील अति महत्त्वाची कार -कीर्द म्हणजे देवानांपियतिस्स या राजाची होय. कारण बुद्ध धर्माचा लंकेतील प्रवेश व प्रसार या कारकीदींत झाला व सर्व लंकेचें व लंकेच्या - लोकांचें स्वरूपच पालटून गेलें. महावंसकाराला या कारकीर्दीची हकीकत देतांना किती व काय लिहूं असें होऊन गेलें असावें, कारण त्यानें ग्रंथाची किती तरी प्रकरणे या एका कारकीर्दीला दिलीं आहेत. अर्थात् भाविक बुद्ध भिक्षूला लंकेंतील बुद्धधर्माच्या प्रवेशाचें व प्रसाराचें विलक्षण आश्चर्य व कौतुक वाटून त्यानें अतिशयोक्तीनें व पाल्हाळानें हवें तें लिहावें हें साहजिक आहे. देवानांपियतिस्स राजा हा मगध देशाच्या अशोकाचा समकालीन होता. देवानांपियतिस्स राजा अनुराद्धपुरपासून आठ मैलांवर -असलेल्या जंगलमय डोंगरावर शिकारीस गेला होता. तेथें त्याला बुद्ध- भिक्षूच्या रूपानें अशोकाचा मुलगा महिंद किंवा महेन्द्र भेटला. राजा बुद्ध- धर्माचीं तत्त्वें समजण्यासारख्या व स्वीकारण्यासारख्या स्वभावाचा आहे असें पाहून महिंदानें त्याला त्या धर्माचीं तत्त्वें सांगितलीं. राजाला तीं पटून त्यानें बुद्धधर्म स्वीकारला व त्या महिंदाला मोठ्या आदरानें व मानानें आपल्या राजधानींत आणले व आपल्या महामेघवन नांवाच्या प्रचंड बागेंत जमलेल्या प्रजेस महिंद्राकडून बुद्धधर्माचीं तत्त्वें सांगविलीं व राजाच्या प्रजेनें राजाचें अनुकरण करून बुद्धधर्म स्वीकारला. राजानें आपली महामेघवन नांवाची नंदनवनासारखी बाग महिंदास व बुद्धभिक्षूंस वक्षीस दिली व तेथें त्यानें त्यांच्या करितां महाविहार बांधला. देवानांपियतिस्स राजाला ज्या पर्वतावर बुद्ध धर्माचा उपदेश झाला व ज्यावर महेन्द्र प्रथम येऊन उतरला त्या पर्वताला महेन्द्र पर्वत ( अर्वाचीन मितिल ) हें नांव मिळालें. हें ठिकाण लंकेतील बुद्धधर्माचें फार पुरातन व फार पवित्र असें यात्रास्थान बनलें. त्या पर्वतावर किती तरी स्तूप, विहार इत्यादि<noinclude></noinclude>
c7xm19vpy3nuzid5kfy1hd8oqyig2i9
235859
235852
2026-08-21T10:15:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235859
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|१९ }}</noinclude>असा राजा होय. त्यानेंच प्रथम '''अनुराद्धपुर''' येथे राजधानी स्थापन करून मोठमोठ्या इमारती बांधण्यास सुरवात केली. त्यानें राज्यही खूप काळ केले. त्यांमुळे त्या राज्याला स्थैर्य व बळकटी आली.
{{gap}}पंडुकाभयाच्यापेक्षांही लंकेच्या इतिहासांतील अति महत्त्वाची कारकीर्द म्हणजे '''देवानांपियतिस्स''' या राजाची होय. कारण बुद्ध धर्माचा लंकेतील प्रवेश व प्रसार या कारकीदींत झाला व सर्व लंकेचें व लंकेच्या लोकांचें स्वरूपच पालटून गेलें. महावंसकाराला या कारकीर्दीची हकीकत देतांना किती व काय लिहूं असें होऊन गेलें असावें, कारण त्यानें ग्रंथाची किती तरी प्रकरणे या एका कारकीर्दीला दिलीं आहेत. अर्थात् भाविक बुद्ध भिक्षूला लंकेंतील बुद्धधर्माच्या प्रवेशाचें व प्रसाराचें विलक्षण आश्चर्य व कौतुक वाटून त्यानें अतिशयोक्तीनें व पाल्हाळानें हवें तें लिहावें हें साहजिक आहे. देवानांपियतिस्स राजा हा मगध देशाच्या अशोकाचा समकालीन होता. देवानांपियतिस्स राजा अनुराद्धपुरपासून आठ मैलांवर असलेल्या जंगलमय डोंगरावर शिकारीस गेला होता. तेथें त्याला बुद्धभिक्षूच्या रूपानें अशोकाचा मुलगा '''महिंद''' किंवा महेन्द्र भेटला. राजा बुद्धधर्माचीं तत्त्वें समजण्यासारख्या व स्वीकारण्यासारख्या स्वभावाचा आहे असें पाहून महिंदानें त्याला त्या धर्माचीं तत्त्वें सांगितलीं. राजाला तीं पटून त्यानें बुद्धधर्म स्वीकारला व त्या महिंदाला मोठ्या आदरानें व मानानें आपल्या राजधानींत आणले व आपल्या महामेघवन नांवाच्या प्रचंड बागेंत जमलेल्या प्रजेस महिंद्राकडून बुद्धधर्माचीं तत्त्वें सांगविलीं व राजाच्या प्रजेनें राजाचें अनुकरण करून बुद्धधर्म स्वीकारला. राजानें आपली महामेघवन नांवाची नंदनवनासारखी बाग महिंदास व बुद्धभिक्षूंस बक्षीस दिली व तेथें त्यानें त्यांच्या करितां महाविहार बांधला. देवानांपियतिस्स राजाला ज्या पर्वतावर बुद्ध धर्माचा उपदेश झाला व ज्यावर महेन्द्र प्रथम येऊन उतरला त्या पर्वताला महेन्द्र पर्वत (अर्वाचीन '''मिहिंतिल''') हें नांव मिळालें. हें ठिकाण लंकेतील बुद्धधर्माचें फार पुरातन व फार पवित्र असें यात्रास्थान बनलें. त्या पर्वतावर किती तरी स्तूप, विहार इत्यादि<noinclude></noinclude>
et9h3w55srfj4dfqfom60rxqij73w3q
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२८
104
111694
235861
2026-08-21T10:27:26Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235861
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२० |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>धार्मिक इमारती उभारल्या गेल्या; पर्वतावर चढण्याकरितां मोठ्या प्रशस्त दगडाच्या बाराशें पायऱ्या बांधण्यांत आल्या. महिन्द अनुराद्धपुरास आल्यावर व तेथें राहिल्यावर राजाच्या विनंतीवरून त्याची बुद्ध भिक्षुकीण बनलेली बहीण सुमिता ही लंकेस आली. ज्या बुद्धगया येथील पिंपळाच्या वृक्षाखालीं गौतमबुद्धास बुद्ध- धर्मज्ञान- प्राप्ति झाली त्या पिंपळाची एक खांदी तिनें बरोबर आणली. त्या खांदीची मोठ्या समारंभानें मिरवणूक काढण्यांत आली. व ती खांदी महामेघवन बागेतील एका स्वतंत्र बांधलेल्या आवारांत पुरून तेथें देवालय बांधण्यांत आलें. अनुराद्धपुर येथें हा पवित्र पिंपळवृक्ष तेव्हांपासून आजं तागाईत जीवंत असून मिहिंतले पर्वतापेक्षांही तो अधिक पवित्र मानण्यांत येतो. हजारों बुद्ध धर्मी लोक या वृक्षाच्या दर्शनास दरवर्षी येतात व या वृक्षाचें एखादें पान पवित्र म्हणून परत जातांना घरीं घेऊन जातात. देवानांपियतिस्स राजाची कारकीर्द सुमारें चाळीस वर्षांची झाली.
{{gap}}नंतर त्याचा बंधु '''उत्तीय''' हा राज्यावर आला. याच्या कारकीर्दीच्या आठव्या व नवव्या वर्षी अनुक्रमें '''महिंद''' व '''सुमिता''' हीं दोघें बहीणभांवडेंं वारलीं व त्यांचीं स्मारके मिहिंतले येथें व इतर ठिकाणी झाली.
{{gap}}उत्तीयानंतर दोन बंधु एकामागून एक राज्यावर आले. दुसरा बंधु '''सुरतिस्स''' याचे कारकीर्दीपासून दक्षिण हिंदुस्तानच्या केरल, मदुरा व त्रावणकोर या निरनिराळ्या राज्यांतून तामीळ लोक लंकेंत येऊन वसाहत करूं लागले व त्यांच्या मनांत लंकेचें राज्य बळकावण्याची महत्त्वाकांक्षा उद्भूत झाली. याचें प्रत्यंतर म्हणजे कांहीं तामीळ तरुणांनी सुरतिस्स राजाविरुद्ध कट करून त्याला ठार मारलें व त्याचें राज्य बळकावलें. '''असेल''' या बंधूनें तामीळांचा बीमोड करून आपले राज्य परत मिळविलें, पण या काळापासून लंकेंत तामीळ लोकांची वसाहत वाढत गेली. पुढें तर तंजावरच्या '''इलाला''' नांवाच्या तामीळ राजानें लंकेवर मोठ्या सैन्यानिशीं स्वारी करून असेल राजाचा रणांगणावर पराभव करून त्याला ठार मारून तो अनुराद्धपूर येथे कायमचा येऊन लंकेचें राज्य करूं लागला. पण जरी हा राजा परकी<noinclude></noinclude>
alw2hj1aomtwgu4wobv6rhlfx6kgqw2
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/२९
104
111695
235862
2026-08-21T10:31:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235862
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|२१ }}</noinclude>होता तरी त्यानें राज्य उत्तम तऱ्हेनें केलें. त्यानें राजवाड्याबाहेर एक घंटा बांधून ठेविली होती; कोणालाही ती घंटा वाजवून आपले गाऱ्हाणें राजाला समक्ष सांगण्याची मुभा होती. राजा प्रजेचे गाऱ्हाणे ऐकून ताबडतोब तें दूर करीत असे. हा राजा इतका न्यायनिष्ठुर होता कीं आपल्या मुलानें एका खोंडाला हलगर्जीपणानें आपल्या रथाखाली चेंगरून मारल्यावरून राजानें त्या मुलाला देहांत शिक्षा दिली!
{{gap}}असेल राजाला इलालानें ठार मारले खरें; पण त्याचे बंधु व इतर राजघराण्यांतील मंडळी यांनीं आपली कशी तरी सुटका करून घेऊन ती सर्व राजमंडळी महावेलीगंगा नदीच्या पलीकडच्या जंगली प्रदेशांत गेली. तेथें राजाच्या बंधूनें लहानसें राज्य स्थापिलें. त्या राजाला '''गामनी''' म्हणून एक शूर व महत्त्वाकांक्षी पुत्र झाला. तो लहानपणीं सुद्धां आंथरुणावर हातपाय आंखडून निजे. राणीनें असें करण्याचें कारण विचारतां "काय करावें, हातपाय पसरून निजावयास जागा कोठें आहे? दक्षिणेस समुद्र आला व गंगेच्या पलीकडचें आपलें राज्य तामीळ राजाच्या हातीं आहे," असें त्यानें खोंचदार उत्तर दिलें.
{{gap}}यावरून लहानपणापासूनच गामनीची महत्त्वाकांक्षा उद्दीपित झालेली होती असें दिसतें. त्यानें आपल्याभोंवतीं दहा शूर, वीर असे तरुण जमविले व त्या प्रत्येकाला दहा दहा तरुण लोक तयार करण्यास सांगितलें. अशा तऱ्हेनें त्यानें मोठें सैन्य तयार केलें. त्यानें दोन वेळा इलालावर स्वारी करण्याकरितां बापाची परवानगी मागितली. पण राजानें ती नाकारली. तेव्हां गामनीनें राजाकडे बांगडी पाठवून ती हातांत घालण्यास सांगितलें. तात्पर्य, राजानें बायकांप्रमाणें हातांत बांगड्या घातल्या असून तो भित्रा आहे तेव्हां त्याची आज्ञा पाळण्यांत अर्थ नाहीं असें म्हणून गामनीनें इलालाच्या राज्यावर स्वारी केली. तेव्हांपासून गामनीला '''दत्त''' (बंडखोर) गामनी असें टोपण नांव पडलें. आपल्या सैन्यानिशीं दत्तगामनीनें प्रथमतः '''विजितपुराला''' वेढा देऊन तें कांहीं महिन्यांनी काबीज केलें. मग त्यानें खुद्द अनुराद्धपुरावर स्वारी<noinclude></noinclude>
coqydpznbsfb0xji2jrdl8xlhyuyd6c
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३०
104
111696
235863
2026-08-21T10:37:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235863
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२२ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>केली. इलाला हा शूर राजा होता. तो आपल्या सैन्यानिशीं दत्तगामनीच्या सैन्यासमोर युद्धाकरितां उभा राहिला व हत्तीवर बसून त्यानें दत्तगामनीवर स्वतः हल्ला केला. दोघेही राजे शूर असल्यामुळे खऱ्या योद्ध्याप्रमाणें ते लढले. त्यांत इलालाचा हत्ती पडला. मग इलालाला दत्तगामनीनें धारातीर्थी पाठविलें. पण खऱ्या शूर वीर पुरुषाला शोभेल अशा तऱ्हेनें दत्तगामनीनें इलालाच्या शवाचें दहन केलें. व त्या जागेवर एक स्मारक छत्री बांधली, व लंकेच्या प्रत्येक राजानें या स्मारकछत्रीला नमस्कार करून मग पुढें जावें असा नियम केला. या नियमाची अंमलबजावणी ब्रिटिश कारकीर्दीपर्यंत चालू होती. इलाला राजाबद्दल दत्तगामिनीला केवढा आदर होता हे यावरून दिसून येतें.
{{gap}}दत्तगामनी हा अनुराद्धपुर राजधानींतला तिसरा मोठा कर्तबगार राजा होऊन गेला. त्यानें प्रथमतः प्रचंड लोहप्रासाद (brazen palace) बांधला. यानेंच '''ऋवनवेली''' दागबा बांधण्यास प्रारंभ केला. यानेंच राज्यांत तलाव बांधले व ओसाड जमीन लागवडीस आणली. याचेच कारकीर्दीत अनुराद्धपुराचा लंडनसारखा विलक्षण विस्तार झाला. याची कारकीर्द सुमारें पंचवीस वर्षांची झाली.
{{gap}}दत्तगामनीच्या राजपुत्राचें एका चांडाल कन्येवर प्रेम बसलें. तिच्याकरितां त्यानें राज्यावरचा हक्क सोडला. म्हणून दत्तगामनीचे दोन भाऊ एकामागून एक राजे झाले. पुढें पहिल्या भावाचा पुतण्या राज्यावर आला; नंतर त्याचा पुत्र राज्यावर आला. पण या राजांच्या कारकीर्दी लवकर लवकर संपल्या. 'हे राजे आले व गेले' अशापैकींच यांच्या कारकीर्दी झाल्या.
{{gap}}पुढें '''कालुने''' नांवाचा राजा झाला. याचे कारकीर्दीत चोल देशांतील तामील राजांनी लंकेवर स्वारी केली व लंकेचें राज्य बळकावलें. अर्थात् पूर्वीचें राजघराणें इलालाच्या काळाप्रमाणे जंगलांत जाऊन राहिलें. पुढें त्यांतील '''वलंगबाहु''' राजानें तामीळ राजाचा पराभव करून आपलें<noinclude></noinclude>
51uc0pfkppdlj3cd9kg2tgttsdf8ahn
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३१
104
111697
235864
2026-08-21T10:45:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235864
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|२३ }}</noinclude>राज्य परत मिळविलें. त्यानें अनुराद्धपुर येथील अभयगिरी दागवा बांधला; तसेंच डांबुला येथील विहार बांधला. याचेच काळीं प्रथम बौद्ध धर्माचा ग्रंथ त्रिपीठक ताडपत्रावर लिहिला गेला. यानेंच प्रथम एका बाजूस मनुष्याची आकृति व दुसऱ्या बाजूस स्वस्तिकाची आकृति अश तांब्याची नाणी पाडली.
{{gap}}पुढें पुनः ''''आलेगेले'''' कोटींतील राजे झाले. '''कुडतिस्स''' राजाची राणी '''अनुला''' ही तर इतकी नादान व उच्छृंखल राणी निघाली कीं तिनें अर्वाचीन अमेरिकन उच्छृंखल बाईच्यावर कडी केली. तिनें सहा वर्षांत बत्तीस पती केले, व आपण राज्य करूं लागली. कुडतिस्स राजापासून तिला झालेला राजपुत्र '''मकलंतिस्स''' हा फार चांगल्या स्वभावाचा होता. त्यानें आपल्या आईस राज्य करूं दिलें. पण तिनें जे अनन्वित प्रकार केले त्यायोगें राजपुत्राला प्रजेबद्दल कींव येऊन त्यानें स्वारी करून आईकडून राज्य हिसकावून घेतलें. शहराच्या आगीत आई जळून मेली. या राजानें राज्याची उत्तम व्यवस्था ठेविली. देशांत पुष्कळ तलाव बांधले, अनुराद्धपुर शहराला तट बांधला. अशीं पुष्कळ लोकोपयोगी कामें त्यानें आपल्या कारकीर्दीमध्ये केली.
{{gap}}याचे नंतर बरेच राजे झाले; पण संध्येच्या नांवाप्रमाणें त्यांचीं नुसतीं नांवें सांगण्यांत काय रहस्य आहे? शिवाय महावंसामध्ये सुद्धां नऊ राजे, अकरा राजे, अशीं मोघम नांवाचीं प्रकरणें आहेत. यावरून या काळांत नांव घेण्यासारखा पुरुष झाला नाहीं असें सिद्ध होतें. परकी स्वाऱ्यांनीं व राजघराण्यांतील कलागतींनी देशामध्यें अंदाधुंदी होऊन देशाची स्थिति खालावली. राजघराण्यांतील '''सिरीनाग''' नांवाच्या एका सेनापतीनें आपल्या स्वामीला मारून आपण राज्य बळकावलें. त्याचा पुत्र '''अभयतिस्स''' नांवाचा चांगला राजा निपजला. नंतर पुनः कर्तृत्वहीन असे राजे राज्यावर आले. पण '''श्रीसंगबोधी''' हा राजा मात्र साधूसारखा सच्चा व सदाचरणी निघाला. म्हणून बुद्धधर्मी लोक त्याला<noinclude></noinclude>
6rn22zud8ax3xpie2ob9eygwqquwima
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३२
104
111698
235865
2026-08-21T10:51:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235865
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२४ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>फार मान देतात. त्यानें राज्यत्याग केला व शेवटीं आपला प्राण आपल्या अन्नदात्याकरितां देऊन मोठी कीर्ति मिळविली.
{{gap}}यानंतर '''महासेन''' राजा झाला. याचे काळी बुद्ध धर्माच्या निरनिराळ्या पंथांत तंटे सुरू झाले. महासेनानें एका पंथाचा पक्ष स्वीकारून विरुद्ध पंथाची देवळें व इमारती जमीनदोस्त केल्या. या महासेनाच्या कारकीर्दीतील हकीकतीनें महावंस ग्रंथाचा पहिला भाग संपला आहे. येथपर्यंतच्या राजांना '''महावंसांतील राजे''' असें म्हटलें आहे. पुढल्या राजांना लहान वंशांतील राजे म्हटलें आहे.
{{gap}}महासेनाच्या नंतरचा राजा '''कीतसिरी निवाण''' नांवाचा झाला. याच्या कारकीर्दीतील संस्मरणीय गोष्ट म्हणजे इ. सन ३११ मध्यें बुद्धाचा एक दांत हिंदुस्थानांतून एका ब्राह्मण राजकन्येनें लंकेत आणला. तो मोठ्या समारंभानें अनुराद्धपुरामध्यें '''दलद मलिगवा''' नांवाच्या दंत देवळांत ठेवण्यांत आला.
{{gap}}पुढील '''जेठतिस्स''' नांवाच्या राजानें तामिल लोकांनी लुटलेला लोहप्रासाद पुनः बांधला. त्याचा पुत्र '''बुद्धदास'''ही चांगला राजा निपजला. त्याला वैद्यविद्या उत्तम येत असे. त्यानें संस्कृतांत वैद्यकीवर एक ग्रंथही लिहिला होता. त्यानें आपल्या राज्यांत दवाखाने व व्यंग असलेल्या लोकांकरितां विश्रामवाडे (Asylume) बांधले.
{{gap}}पुढच्या '''उपतिस्स''' राजाला राणीनें मारविलें व त्या राणीचा प्रियकर '''महानाम''' सन ४१२ मध्ये राजा झाला. याच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या गोष्टी दोन. पहिली, प्रख्यात चिनी प्रवासी '''फे हायन''' चीनमधून हिंदुस्थानांत येण्याकरितां सन ३९९ मध्ये निघाला, तो हिंदुस्थानांत दहा बारा वर्षे प्रवास करून व बुद्ध-धर्म-ग्रंथ मिळवून लंकेला आला. तेथें दोन वर्षे राहून मग जलमार्गानें आपल्या देशास परत गेला. त्यानें लंकेविषयी माहिती आपल्या प्रवासवृत्तांत लिहून ठेविली आहे. त्यांवरून लंकेची तत्कालीन स्थिति व बुद्ध धर्माचें तेथील स्वरूप याची कल्पना येते.<noinclude></noinclude>
51rretztsci4lrkgqv8vzk4iiplilf6
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३३
104
111699
235866
2026-08-21T10:57:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235866
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|२५ }}</noinclude>दुसरी गोष्ट म्हणजे '''बुद्धघोष''' हा हिंदुस्थानांतील बुद्धधर्मी विद्वान् कवि लंकेंत येऊन राहिला व त्यानें तेथें राहून पाली व संस्कृत भाषेत कित्येक तरी ग्रंथ लिहिले.
{{gap}}'''उपतिस्साच्या''' राजपुत्राला राजकन्येनें व तिच्या पतीनें संगनमत करून ठार मारिलें व '''लामिनीतिस्स''' राजा झाला. नंतरच्या कारकीर्दीत मलबारच्या सरदारांनी स्वारी करून राजाला मारलें. मागच्याप्रमाणें राजघराणें व त्यामधला '''धातुसेन''' राजपुत्र हे महावेलीगंगेपार रुहुनुरत या जंगली ठिकाणीं पळाले. येथें धातुसेनानें सव्वीस वर्षे वनवास भोगला. पण शेवटीं त्यानें आपलें वंशपरंपरागत राज्य पुनः मिळविलें. या धातुसेनाच्या कारकीर्दीमध्यें राजघराण्यांतील भिक्षु महानाम यानें महावंस ग्रंथ लिहिला. त्यावरून धातुसेनाच्या कारकीर्दीत बरीच व्यवस्था व स्थिरस्थावरता झाली होती असें दिसतें. पण लवकरच गृहकलह सुरू झाले. आदिगर नांवाचा मोठा सरदार हा धातुसेनाचा जावई होता. त्यानें आपल्या पत्नीस म्हणजे धातुसेनाचे मुलीस क्षुल्लक कारणावरून मारलें. स्वतःची बहीण आदिरची आई हिला ठार मारून स्वतःच्या मुलीला मारल्याचा सूड धातुसेनानें उगवला. म्हणून आदिगर धातुसेनावर संतापला व त्याचा सूड घेण्याकरितां धातुसेनाच्या दुसऱ्या मुलाला (कश्यपाला) राज्यपदाचें आमिष दाखवून त्यानें आपल्या कटांत घेतलें. नंतर धातुसेनाला कैद केलें व कश्यपानें राज्यलोभानें आपल्या बापाला भिंतींत जिवंत पुरून मारलें. पण धातुसेनाचा थोरला मुलगा '''मोगलान''' कश्यपाचा सूड घेण्याकरितां व राज्य मिळविण्याकरितां हिंदुस्थानास गेला. तेथे त्यानें मोठें सैन्य जमविण्याचा उद्योग सुरू केला. कश्यपानें भीतीनें अनुराद्धपुर सोडून '''सिगिरीया''' या अगम दुर्गावर राजवाडा बांधून तेथून अठरा वर्षे राज्यकारभार चालविला; पण शेवटी मोगलान मोठें सैन्य घेऊन आला व त्यानें कश्यपाच्या सैन्यावर हल्ला केला; भिऊन जाऊन कश्यपानें आत्महत्या केली.
{{gap}}याच राजाच्या कारकीर्दीमध्यें काशीहून बुद्धाचा एक दांत आणण्यांत आला व त्याकरितां अर्थात् एक स्मारकस्तूप बांधण्यांत आला. याच्या<noinclude></noinclude>
4iix4fffii78afwubcdgtvi64vkspz7
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३४
104
111700
235867
2026-08-21T11:03:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235867
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२६ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>पुढला राजा '''कुमारदास''' याच्या कारकीर्दीमध्यें कालिदास लंकेत येऊन या राजदरबारी कांहीं काळ राहिला अशी दंतकथा आहे. या राजाच्या कारकीर्दीचा काळ सन ५७५ हा आहे.
{{gap}}पुढें दोन राजे आले-व-गेले कोटींतील होते. नंतर '''अगबोधी''' नांवाचें चार पांच राजे झाले. ते विद्येचे चाहते असून त्यांनीं एकंदरीत राज्यव्यवस्था चांगली राखली. सातव्या अगबोधीच्या कारकीर्दीत पोलनरुवा ही राजधानी झाली. पहिल्या '''सेन''' राजाच्या वेळीं तामीळ राजांनी लंकेवर स्वारी करून पोलनरुवा काबीज केलें व त्यांनीं पुष्कळ वर्षे तेथें राज्य केलें. त्या काळापासून लंकेचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडून दोन राज्यें झाली. पण '''विजयबाहु''' पराक्रमी निघाला, त्यानें तामीळ राजांना सन १०६५ मध्ये आपल्या देशीं हाकून लावलें व लंकेचें पुनः एकसूत्री राज्य केलें. या घराण्यांत दोन चार मोठे राजे होऊन गेले. त्यांचे कारकीदींतच पोलनरुवा ही राजधानी वैभवास चढली व तेथें अनुराद्धपुरापेक्षांही मोठ- मोठीं देवळें व राजवाडे बांधण्यांत आले. या राजघराण्यांत पहिला '''पराक्रमबाहु''' म्हणून अत्यंत कर्तृत्ववान् असा राजा झाला.
{{gap}}त्याच्या कारकीर्दीमध्यें '''पोलनरुवा''' राजधानी अनुराद्धपुराच्या वरकडी अशी विस्तीर्ण व सुंदर बनली. लंकेच्या उत्कर्षाची व वैभवाची पराकाष्ठा याच राजाच्या कारकीर्दीत झाली. म्हणूनच ज्याप्रमाणें '''देवांनापियतिस्साच्या''' किंवा '''दत्तगामनी'''च्या कारकीर्दीसंबंधीं महावंसकारांना काय लिहू किती लिहूं, काय वर्णू किती वर्णू असें होऊन गेलें, त्याचप्रमाणें '''पराक्रमबाहूच्या''' कारकीर्दीसंबंधीं लिहितांना त्यांची कल्पनाशक्ति अनावर झाली व त्यांनी या एका राजाच्या कारकीर्दीला ग्रंथाची किती तरी प्रकरणें दिली आहेत. '''विक्रमबाहु''' (विजयबाहूचा पुत्र व पुष्कळ काळपर्यंत राज्य केलेला राजा) याचा थोरला पुतण्या '''मानभरण''' याला '''विजयबाहूची''' मुलगी दिली होती. या दांपत्याचें अपत्य '''पराक्रमबाहु''' होय. विक्रमबाहूला या नातवाच्या जन्मामुळे आनंद झाला. लहानपणापासून पराक्रमबाहूमध्यें भावी मोठेपणाचीं चिन्हें दिसत होती. त्यानें कला, शास्त्र व धर्म<noinclude></noinclude>
0kx21jm7eejx4hph4wsmyt4gc5m6zur
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३५
104
111701
235868
2026-08-21T11:18:50Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235868
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचा दंतकथात्मक इतिहास|२७ }}</noinclude>यांचा चांगला अभ्यास केला व राज्यकर्त्याला आवश्यक गुण व गोष्टी संपादन केल्या. पण पराक्रमबाहु अजून तरुणच असतांना विक्रमबाहु मरण पावला. त्याचा दुर्बल मुलगा गजबाहु हा राज्यावर आला. पराक्रमबाहु आपला चुलता गजबाहु याला भेटावयास पोलनरुवा येथें गेला. गजबाहूनें त्याला आग्रहानें व आदरानें ठेवून घेतलें. पराक्रमबाहूनें आपला काळ तेथली लोकस्थिति व जनमन यांची माहिती मिळविण्यांत घालविला. पोलनरुवांत त्याच्या जीवाला अपाय होईल या भीतीनें त्याच्या आईनें पराक्रमबाहूला परत आपल्या रहात्या ठिकाणीं बोलाविलें. अजून योग्य संधि आली नाहीं असें पाहून पराक्रमबाहु परत आला. इतक्यांत त्याचा पालक चुलता वारला. नंतर तेथल्या छोट्या राजाचा कारभार पराक्रमबाहु पाहूं लागला व तो त्यानें फारच उत्तम रीतीनें केला. तेव्हांपासून पराक्रमबाहूचें हें ध्येय "कीं माझ्या राज्यांत जमिनीचा एक तुकडाही असा राहूं नये कीं ज्यापासून प्रजेला उत्पन्न मिळणार नाहीं." म्हणून त्यानें जागोजाग तलाव बांधले, पाटाचीं कामें केलीं, झाडे लावलीं, व नवी जमीन लागवडीस आणिली. आपलें सामर्थ्य वाढलें आहे असें पाहून त्यानें गजबाहूवर हल्ला केला. त्यामध्यें त्याला पूर्णपणे यश येऊन त्यानें अनुराद्धपुर राजधानी काबीज केली. नंतर पोलनरुवा शहर घेतलें. त्यानें गजबाहूला चांगल्या तऱ्हेनें वागविलें. पण गजबाहु लवकर मरण पावला. पराक्रमबाहूसारखा कर्तृत्ववान राजा सर्व लंकेचा राजा झाला म्हणून सर्व प्रजेला आनंद झाला. पराक्रमबाहूला सन ११६४ मध्ये राज्याभिषेक करण्यांत आला.
{{gap}}त्यानें आपल्या सर्व राज्याचा उत्तम बंदोबस्त केला. तो करण्याकरितां त्याला पुष्कळ लढाया कराव्या लागल्या, पण तो त्यांत यशस्वी झाला. मग त्यानें सर्व देशभर लोकोपयोगी कामें केलीं; अनुराद्धपुराची दुरुस्ती करून त्या राजधानीची झालेली दैना दूर केली; पोलनरुवा राजधानीस तर त्यानें प्रति '''अमरावती''' बनविलें. हल्लीं शोधून काढलेलें पोलनरुवा शहर पराक्रमबाहच्या काळचेंच होय. पराक्रमबाहूनें याप्रमाणें<noinclude></noinclude>
3iaor63ld0jg5t41575osy6c6o4vonm
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३६
104
111702
235869
2026-08-21T11:21:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235869
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|२८ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>सर्व लंका बेटाला पूर्वकाळचें वैभव व संपन्नता आणून दिली. त्यानें एकंदर तेहतीस वर्षे राज्यकारभार केला. पराक्रमबाहूला पुष्कळ राण्या होत्या. त्यांपैकीं लीलावती व रूपवती या त्याच्या फार आवडत्या राण्या होत्या. पराक्रमबाहूनंतर त्याच्या बहिणीचा मुलगा राज्यावर आला. त्याने चांगल्या प्रकारें राज्य केलें. पण पुढले राजे दुर्बळ निघाले व आपसांतील तंट्यामुळे तामीळ राजांनीं पुनः लंका काबीज केली. पुढे त्यांचेही वैभव कमी झालें. पंधराव्या शतकांत '''कँडी''' ही '''विमलधर्म''' या राजानें आपली राजधानी केली. पण एव्हांपासून युरोपीयन लोकांची टोळधाड लंकेवर सुरू झाली. त्यांनी लंकेचा किनारा व त्यालगतचा मुलुख ताब्यांत घेऊन तेथे हळूहळू आपला अंमल सुरू केला. कँडीचे राजे यांनी दोन शतकें कसेंबसें डोंगराळ मुलुखांत राहून आपलें खड्यासारसे छोटे राज्य संभाळले. पण कँडीचा शेवटचा राजा '''श्रीविक्रमराजसिंह''' याला इंग्रजांच्या हातावर राज्याचें दान देऊन सन १८१५ मध्यें राजसंन्यास घ्यावा लागला. पण पंधराव्या शतकापासून लंकेचा अर्वाचीन काळ सुरू होतो. त्या काळची सविस्तर माहिती पुढील 'लंकेचा अर्वाचीन इतिहास' या प्रकरणांत येईल. तेव्हां हें प्रकरण येथें संपविणें रास्त आहे.

{{rule|5em}}{{rule|7em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
enh6ffsrnzdblq72pz3e37dg5e2knxl
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/३७
104
111703
235870
2026-08-21T11:26:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235870
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ३ रें'''}}}}
{{rule|7em}}
{{center|{{x-larger|'''लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}{{x-larger|'''पु'''}}'''रातन''' कालापासून लंका बेटाला जायचे दोन मार्ग माहीत आहेत. एक खुष्कीचा व एक जलमार्ग. पूर्वकाळीं जलमार्ग काय किंवा खुष्कीचा मार्ग काय दोन्हीही बिकट व संकटमय होते. पण आतां आगगाड्या व आगबोटी या साधनांच्या सोयीमुळे दोन्ही मार्गांनी दोन तीन दिवसांत लंकेला जातां येतें. साउथ इंडियन रेल्वेनें धनुष्कोडी धक्क्यापर्यंत आगगाडीनें जावयाचें. तेथून आगबोटीनें दोन तासांत लंका बेटाच्या तलाईमानार धक्यावर उतरावयाचें. तेथून लंकेंत कोठेही आगगाडीनें जातां येतें. मी लंकेला सबंद जलमार्गाने गेलों. हल्लीं इटालीयन लॉइड ट्रीस्टीनो कंपनीनें ट्रीस्ट बंदरापासून चीनमधील शांघाय बंदरापर्यंत जाणाऱ्या दरमाही आगबोटींची रहदारी सुरू केली आहे. ती आगबोट मुंबईहून दोन दिवसांनी कोलंबो बंदरास पोहोंचते. मी ता. २२ नोव्हेंबर १९३३ रोजी '''काँटे रॉसो''' बोटीनें दिवसा बारा वाजतां मुंबई बंदर सोडलें. काँटेरॉसो ही इटालीयन कंपनीची बोट वीस हजार टनाची असून ती दर तासास सुमारें वीसबावीस मैलांच्या वेगानें जाते. तीन चार वर्षांखालीं मी या कंपनीच्याच आगबोटीनें विलायतचा जाता येताचा प्रवास केला होता. त्यावेळीं त्यांच्या बोटी छोट्या होत्या. पण काँटे रॉसो ही खरोखरीच फार मोठी बोट आहे. तीला एकावर एक पांच मजले (डेक्स) आहेत. सर्वांत वरच्या कप्तानाच्या केबीनी पांच मजली इमारतीच्या वरच्या खोल्यांसारख्या उंच दिसतात. पहिल्या वर्गाचा बसावयाचा दिवाणखाना तर एखाद्या राजवाड्यांतील सुंदर दिवाणखान्याप्रमाण झुंबरांनी, पडद्यांनीं, गालिच्यांनी, मखमाली खुर्च्या टेबलांनीं शृंगारलेला असून भिंतीवर व तक्तपोशीवर सुंदर सुंदर तैलचित्रे व निसर्ग- रमणीय देखावे काढलेले आहेत. म्हणूनच महाराजा सर सयाजीराव गाय-<noinclude></noinclude>
gaij8dxbaeptf9zazg7okhy4iarqz7v
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४८
104
111704
235871
2026-08-21T11:40:11Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235871
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४४ )
अलीकडे चित्पावन समाजांत बरीच निपजूं लागली आहेत, आणि चालूं इति-
हासाचीं बरीचशीं पृष्ठे त्यांच्या स्वार्थत्यागांनीं चित्रित झालेली पहाण्यांत येतात.
भारतीय राजकीय क्षेत्रांतील हक्कांबद्दलचे युद्ध सध्यां चालूंच आहे, तेव्हां यशाप-
यशाचें निश्चित भाकित आतांच करणे, बरेंच धाडसाचे होईल. शिवाय देशाच्या
सर्वच प्रकारच्या परिस्थिति-क्षेत्रांत अंधार पडल्यामुळे, कोणाच्या का कोंब-
क्याच्या आरवण्यानें होईना, पण एकदां उजाडो, असें सर्व भारतवासीयांना
होऊन गेलें आहे. अर्थात् युद्धक्षेत्रावर चित्पावनांची फलटणें विक्टोरिया क्रॉसचीं
पदकें अधिक पटकावतात कीं बंगालच्या चित्रगुप्त कायस्थांच्या सेना अधिक
बहाद्दरी गाजवितात, याचें भविष्य करण्याचा रिकामटेकडा धंदा करण्यांत कांहीं
अर्थ नाही. तथापि घोड्यांच्या शर्यतींत पैजेचीं टिकिटें खरेदी करण्यापूर्वी शर्य-
तभक्त जसे प्रत्येक घोड्याच्या पूर्वेतिहासाचे काळजीपूर्वक अध्ययन करतात,
त्याप्रमाणे मुत्सद्देगिरी आणि राजकारण यांत चित्पावन समाजाने आजपर्यंत कोण-
कोणत्या शर्यती जिंकल्या आहेत, त्यांचा इतिहास पहाण्यास कांहीं हरकत नाहीं.
मागील इतिहासावरून असें निश्चित सांगण्यास कांहीं प्रत्यवाय नाहीं कीं
चित्पावनांत मुत्सद्देगिरी फार कमी होती आणि राजकीय क्षेत्रांत तर त्यांना
कधींहि यश आलेलें नाहीं. चित्पावन मुत्सद्यांत जर खरोखर कांहीं मुत्सद्देगिरी
असती तर त्यांना पेशवाई बुडविण्याचा त्यांच्यावर प्रसंगच आला नसता.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या काळापासून तो राजारामाला अभिषेक होई-
पर्यंतच्या क्रांतीचा आणि राष्ट्रीय संकटांचा काळ, आणि थोरल्या माधवराव
पेशव्याच्या मृत्यूपासून तो शेवटच्या रावबाजीच्या यः पलायते सजीवतीपर्यंतचा
काळ, या दोन काळांची आपण तुलना केली, म्हणजे वरील विधानांची
सत्यता पटेल. पहिल्या काळांतले सारे मुत्सद्दी महाराष्ट्र ( देशस्थ ) ब्राह्मण,
क्षत्रिय मराठे व चां. का. प्रभू हे होत आणि दुसऱ्या काळांतले राजकीय क्षेत्र
शुद्ध चित्पावनांनी गजबजलेलें होतें; उगीच एखादा सखाराम बापू बोकीलासारखा
देशस्थ वाटाणा मुत्सद्यांच्या आमटीत नांवाला हात लागतो इतकेंच. पहिल्या
काळांत, संभाजीच्या मृत्यूनंतर महाराष्ट्राला अवरंगझेबासारख्या सर्वसमर्थ जबर-
दस्ताशीं तोंड द्यायचें होतें आणि दुसऱ्या काळांत नुसत्या युक्तीबाज आणि अल्प-
समर्थ अशा इंग्रजी व्यापारी मंडळीशीं डांवपेचांचा शुद्ध बुद्धीबळाचा खेळ खेळा-
वयाचा होता. पहिल्या प्रसंग महाराष्ट्राची मान अवरंगझेबाच्या तलवारीच्या<noinclude></noinclude>
4xa6vfutuigmp0uujmpo8ly701pql1q
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/४९
104
111705
235872
2026-08-21T11:40:29Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235872
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>18 JAN 1994 ४५ )
पात्यावर मूर्तिमंत टॅकलेली होती, दुसऱ्या प्रसंगी महाराष्ट्र आसनमांडी - किंवा
म्हणा वाटेल तर वीरासन - घालून टोपकरांशी बुद्धीबळाच्या सामन्याच्या हाराज-
कीवर आपल्या सोक्षमोक्षाची किमया करीत होता. पहिल्या प्रसंगांतली
सतीच्या वाणाची तीव्रता दुसऱ्या प्रसंगांत मुळींच नव्हती. असें
असूनसुद्धां पहिल्या प्रसंगांतल्या मुत्सद्यांनी नुकताच स्थापन झालेला व एकाकी
ढांसळून पडलेला हिंदवी स्वराज्याचा टोलेजंग रायगड हां हां म्हणतां आपल्या
हातांवर झेलून धरला आणि त्याची पुनश्च भक्कम पायावर उत्कृष्ट उभारणी करून
अवरंगजेबासारख्या सहस्राबाहू व सहस्राक्षालासुद्धां तोबा तोबा म्हणण्यास भाग
पाडावे आणि दुसन्या प्रसंगांतील मुत्सद्यांना पेशवाईवर तिलांजली देण्यापलीकडे
गत्यंतरच नसावें, यावरून काय सारांश निघतो तो वाचकांनींच अजमावून
पहावा. रा. ब. चिंतामणराव वैद्यांचा तर्काप्रमाणे दुसन्या प्रसंगी राष्ट्रांत खन्या
स्वदेशाभिमानाचा दुष्काळ होता, ह्मणून अल्पसमर्थ टोपकरांच्या झगड्यांत सर्व-
समर्थ पेशवे हटले, असें जरी मान्य केलें तरी स्वदेशाभिमानाचा दुष्काळ उत्पन्न
करण्याची पेशव्यांवरची जबाबदारी कांहीं टळत नाही. पहिल्या प्रसंगांत जर
स्वदेशाभिमान होता तर तो नष्ट करण्याच्या पातकांतून दुसऱ्या प्रसंगातल्या
मंडळींची सुटका होत नाहीं. शिवाय स्वदेशाभिमानावांचून नुसतें लष्करी सामर्थ्य
किंवा मुत्सद्देगिरीचा दिमाख राष्ट्रसंरक्षणाच्या कामी उपयोगी पडत नाहीं, हें सम-
जून उमजून राष्ट्रांतल्या स्वदेशाभिमानाचा वृक्ष स्वार्थाच्या करवतानें कांपून खच्ची
करणे, यांत मुत्सद्दीपणा तो काय राहिला ? पूर्वी स्वदेशाभिमान होता तर तो
काय कोणी घालविल्याशिवायच गेला ? अर्थात् तो पेशव्यांनींच ज्याअर्थी घाल.
विला त्याअर्थी त्यांच्या मुत्सद्दीपणाच्या वखारींत पुढे शेणाच्या पणत्या कां लागल्या
हैं निराळे सांगण्याची जरूरच नाहीं. पहिल्या प्रसंगांतल्या मुत्सद्यांनीं व लढवय्यांनी
मुत्सद्दीपणाचे व राजकारणाचे धडे वंशपरंपरेनें मिळविलेले असून शिवाय त्यांत
खुद्द शिवाजी महाराजांच्या खास वळणाची भर पडलेली होती. स्वदेशाभिमान
व स्वराज्याभिमानाच्याच तोडीने या मंडळींनीं आपली स्वामीनिष्ठा, सत्यप्रियता
आणि इमान ही चोख राखल्यामुळेच शिवाजीचा मुलगा राजाराम याच्या वैयक्तिक
अप्रबुद्धतेबद्दल चकार शब्द न काढतां किंवा अवरंगझेबाच्या फाटाफूट करण्याच्या
कारस्थानाला बळी पडण्याइतकी स्वार्थाची विकारवशता यत्किंचित् हि न दाखवितां,
फक्त शिवरायाच्या नांवाचा अभिमान धरून त्यांनीं न भूतो न भविष्यति
4<noinclude></noinclude>
446b65ozyg151jy5zfl3nl2glbdl8xc
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५०
104
111706
235873
2026-08-21T11:40:43Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235873
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४६ )
अशीं स्वार्थत्यागाचीं अनेक संस्मरणीय कृत्य केलीं, शिवाजीच्या
हिंदवी स्वराज्याला महाबलीष्ट अवरंगझेबाच्या घशांतून खेचून बाहेर काढलें
आणि महाराष्ट्रीयांच्या मनगटांतील अनुवंशिक पराक्रमाचा ठसा तत्कालीन् प्रति-
स्पर्थ्यांना सणसणीत ठणकावला. उलटपक्षीं दुसऱ्या प्रसंगांतल्या राजकारणी
मुत्सद्यांचीं व लढवय्यांचीं कृत्ये पहा. ज्यावेळेला बाजीरावावर प्रसंग आला,
त्यावेळेला एकट्या बापू गोखल्याशिवाय एकहि चित्पावन सरदार त्याच्या पाठीशी
उभा राहिला नाहीं. एकाहि मुत्सद्याची अक्कल त्याच्या सहायास आली नाहीं.
उलट श्रीमंतांचे तळपट झालें तर होवो, पण माझ्या वांट्यास आलेल्या जहागि-
रीला उपसर्ग न लागो, म्हणून प्रत्येक चित्पावन सरदार आपापल्या बांधरुंदीकडे
पाहूं लागला. कित्येक इंग्रज रेसिदंटाच्या मंदिराचे उंबरठे झिजवून त्याच्या
नंदीच्या पृष्टभागाला स्पर्श करून ' त्राहि माम् पाहि माम् क्षमस्व' म्हणून कान केस
उपटू लागले. कित्येकांनीं तर उघडउघड घरभेद्येपणा करून श्रीमंतांच्या
राजकारणांतलीं बिर्गे चव्हाट्यावर आणल्याबद्दल अभयपत्रे मिळविल. पेश-
व्यांचें उच्चाटण झाल्यावर शिंदे आणि होळकर
लावण्याकरितां मागाहून जी उठावणी केली, त्यावेळीं तरी कोणी चित्पावन सर.
दारांनीं त्यांना हातभार लावला काय ? ज्याची त्याची स्वार्थावर नजर ! राजा-
रामाच्या वेळच्या राजकारणी मंडळींनीं जर असाच स्वार्थ पाहिला असता, तर
अवरंगझेबानें त्यांच्यावर जहागिरींची नुसती खैरात केली असती आणि यावेळीं
महाराष्ट्र ब्राह्मणांचीं, क्षत्रिय महाठ्यांचीं व चां. का. प्रभूंचीं अनेक संस्थानें
नजरेस पडली असती. पण ते बिचारे भोळे पडले स्वामीनिष्ठ, खाल्ल्या मिठाच
अभिमान धरून जिवाची तमा न बाळगिणारे आणि खऱ्या राजकारणी मुत्सद्दे-
गिरींत मुरलेले ! आज महाराष्ट्रांत जीं अनेक चित्पावनांचीं संस्थानें हयात
आहेत, त्यांचा पाया ' त्राहि माम्' वरच उभारलेला आहे, हें आणखी विषद
करून सांगण्याची अवश्यकता नाहीं.
यांनी कंपनी सरकारला पायबंद
खरें म्हटलें तर राजकारणाच्या पाठशाळेत चित्पावनांचा नुकताच कोठें प्रवेश
झाला होता. राजकारणाची पहिली श्री सन १७१४ त त्यांनी कुठे. घटवायला
घेतली. पण जात्याच ते ऊर्ध्व महत्वाकांक्षी असल्यामुळे, तिच्या प्रत्येक
फुसक्या उसाळीबरोबर चढत चढत त्यांनी केवळ सहा वर्षांच्या अवधीतच राज-
fy<noinclude></noinclude>
g3t7hzfhafou8zkp75l21q7l4jz5dgl
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५१
104
111707
235874
2026-08-21T11:41:00Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235874
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>,
( ४७ )
कारणाच्या 'ॐ नमः सिद्धं ' पर्यंत मजल मारल्याचे पहिल्या बाजीरावाच्याच
तोंडून * जाहीर केलें. बाजीरावानंतर तर काय राजकारणाच्या इत्यलमूचाच पुकारा
अथेति होत गेला. परंतु खऱ्या अनुभवी व कसलेल्या मुत्सद्यांनी पेशवे नोकर-
शाहीच्या डांवपेंचांस कंटाळून राजकारणांतून आपापली आंगे काढून घेतांच, पेश-
वाईत राजकारणाचें व मुत्सद्देगिरीचें नुसतें मढेंच उभे राहिलें. अर्थात्
पंजांत सांपडलेल्या उंदराला गटकावण्यापूर्वी मांजर जसें त्याच्याशीं टिवल्या-
बाव्हल्या करीत असतें, त्याप्रमाणें ता म्हणतां ताकभात ओळखणारे आणि
उडत्या पांखराचीं पिसें डोळे मिटून मोजणारे इट इंडिया कुंफणीचे मुत्सद्दी,
पेशवाई राजकारणाच्या मढ्याशी तहनाम्यांचे आणि वकीलातीचे डांव
चैनीने खळत बसले, यांत कांहीं नवल नाहीं. भुसभुशीत मुत्सद्देगिरीच्या
भरंवशावर पुण्यास स्वतःची मध्यवर्ती सत्ता स्थापन करून, शिरजोर होऊ पहात
असणा-या शिंदे होळकरादि सुभेदारांची उचलबांगडी करून त्यांना दूरदूर लांब-
लांबच्या सुभ्यांवर पांगून ठेवण्याची पेशव्यांनी जी हिकमत लढविली, ती देखिल
मुत्सद्दीपणाच्या अभावामुळे अखेर त्यांच्याच आंगांवर शेकली ना ! फार काय
पण या सुभेदारांचे चित्पावनेतर दिवाण कायकाय मसलती लढवीत होते
किंवा आपल्या धन्याच्या अक्षयीच्या वैभवस्थैर्याकरितां कोणकोणती धोरणें
अंमलांत आणीत होते, याचा देखिल मागमूस ज्या मध्यवर्ती सत्तेच्या पेशव्यांना
किंवा त्यांच्या चित्पावन मंत्र्यांना अजमावता आला नाहीं, त्यांच्या मुत्सद्दी -
पणाची किंवा राजकारणी धोरणाची कोणाला कींव येणार नाहीं ?
एवढी मोठी पानपतची मोहीम लढायला गेलेले सदाशीवराव भाऊसाहेब.
पण त्यालासुद्धां गोविंदपंत बुंदेल्याचे डांबपॅच उमगले नाहींत आणि सरतेशेवटीं
त्याच गोविंदपंतानें पानपतास भाऊचा बळी देऊन महाराष्ट्रांतील तीन लाख
बांगड्या फोडल्याची पुण्याई जोडली. नाना फडणीसाच्या मुत्सद्देगिरीबद्दल मोठी
बोलवा आहे. याबद्दल विस्तृत विवेचन करायला याठिकाणी अवकाश नाहीं.

थोडक्या भांडवलावर आणि पोटापुरत्या अकलेवर देशभक्तीची, लोकसेवेची किंवा
विद्वत्तेची पदवी अलीकडे मुळामुठा युनिवर्सिटींतून कशी पटकन मिळते आणि अप्रसिद्ध
किंवा कुप्रसिद्ध उमेदवार तिच्या पचनी पडतांच चटकन् कसा पांढराफेक सुप्रसिद्ध दे. भ.
होऊन बाहेर पडतो, हें आतां पुष्कळांच्या ध्यानांत आलेलेच आहे. त्याचप्रमाणें राज-
कारणाचे गड्ढेहि अलीकडे बरेच मॅन्युफॅक्चर होऊं लागले आहेत.<noinclude></noinclude>
n8bo66d5mu16ohjbbadi8ms9hruzuf4
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५२
104
111708
235875
2026-08-21T11:41:13Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235875
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४८ )
परंतु ज्याच्या प्रत्येक डांवपेंचानें श्रीमंतांचा पाय अधिकाधिक खोल चिखलांत
रुततच गेला, त्याच्या मुत्सद्दीपणाबद्दल कोण शहाणा तारीफ करील तो करो.
या मागल्या गोष्टीं सोडून दिल्या आणि अगदीं अलीकडे येऊन कित्येक संस्था-
नांतील चित्पावन दिवाणांच्या किंवा कारभाऱ्यांच्या कर्तबगारीकडे लक्ष दिलें,
तरीहि मुत्सद्देगिरी किंवा राजकारणीपणा यांतहि कोणी विशेष सुधारणा दाख-
विल्याचे दिसत नाहीं. उलट कोल्हापूरच्या बरव्यांसारख्यांनीं संस्थानचें नांव
बहु केल्याची उदाहरणे मात्र बरीच दाखवितां येतील.

२५. पुण्याला कोल्हापूरचें कडकडीत वावर्डे आहे, ही गोष्ट आतां कोणास
नव्याने सांगण्याची जरूर नाहीं. त्यांतल्या त्यांत महाराष्ट्राचे मूर्धाभिषिक्त कुळ-
कर्णी केसरीकार आणि करवीरकर छत्रपति यांच्यांत असलेलें अह्निनकुलाचें नातेंहि
तितकेंच लोकविश्रुत आहे. केसरीकार मधूनमधून करवीरकरांवर आपली कुळकर्णी
लेखणी चालवून
छत्रपतींची मोफत जाहीरात देतच असतात. त्यांत अलीकडे
कुळकर्णी - वतनाचा प्रश्न उपस्थित झाल्यापासून तर आमच्या या पुणेकर
राष्ट्रीय कुळकर्ण्याचा बराच तडफडाट झाल्याचे वरचेवर दिसून येतें; शिवाय
कोल्हापुरात हा प्रश्न उपस्थित झाल्यापासून त्या तडफडाटाची डिग्री कमाल
मर्यादेवर भडकलेली दिसते. आम्ही स्वतः कांहीं कुळकर्णी नव्होत किंवा कुळक-
यांच्या वाटाघाटींत आमचें हितहि नाहीं व अहितहि नाहीं. तथापि राम-
नामाच्या उच्चाराबरोबर पिशाच्च जसें बेफाम भडकतें, तसे कोल्हापूर आणि
कुळकर्णी हे दोनच शब्द कानी पडतांच, आमचे पोक्त विचारी केसरीकारहि कसे
अद्वातद्वा बरळू लागतात हॅ पहार्णे अलीकडे बरेंच करमणुकीचे साधन झाले आहे.
सन १९१३ सालीं ' मुकुंदराय' नांवाच्या एका आधुनीक कवीनें
' कुळकणींलीलामृत " नांवानें एक छोटेखानी विनोदप्रचुर ओवीबद्ध पुस्तक
लिहिले व तें कोल्हापूरच्या सत्यशोधक समाजानें छापून प्रसिद्ध केलें.
या पुस्तकाचा परामर्ष केसरीचे त्यावेळचे संपादक रा. नरसोपंत केळक
यांनी ३० सप्टेंबर व ७ आकटोबर १९१३ च्या अंकांत दोन मुख्य
निबंध लिहून घेतला आहे. वास्तवीक केसरीच्या नेहमींच्या सांप्रदा-
याप्रमाणें या विनोदी चोपड्याची विल्हेवाट पोंचट पोंच देऊन लावायला<noinclude></noinclude>
ns5uoaj6j40p69kp6bwio54jiwfessd
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५३
104
111709
235876
2026-08-21T11:41:28Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235876
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४९ )
पाहिजे होती. परंतु या चोपड्याच्या मळपृष्ठावरच कोल्हापूर आणि कुळकर्णी
हे दोन शब्द दिसतांच, सत्यशोधक समाजाची, करवीरकर छत्रपतीची आणि
त्यांच्या दिवाणादि हस्तकांची यथेच्छ खोड मोडण्याची इतकी चांगली संधी
आमचे केसरीकार कशी दवडतील ? त्यांनी पुस्तकाला उलटें सुलटें करून त्याचा
ग्रंथकार, प्रकाशक, अर्पणपत्रिका आणि आभारप्रदर्शन इत्यादी बाब चटचट
आपल्या एडीटरी नेत्रकटाक्षानें वरवर अवगाहन करून पटदिशीं निष्कर्ष काढला
कीं " हैं अमृतरूपी विष कांहीं तरी सैतानी विध्वंसपर कृत्य करण्यास अवतरलें
आहे, अशी कोणाचीहि तेव्हांच खात्री होईल. " केसरीचे वाक्य म्हणजे ब्रह्म-
वाक्य ! त्यांना कुळकर्णी - प्रकरणावर केव्हां तरी एकदां तांडवनृत्य करायचे होतेच.
इतक्यांत हें कुळकणींलीलामृताचें चोपडे त्यांच्या हातीं पडलें, मग सारासार
विचाराची विभूत फूं करून फुंकल्यावर त्यांच्या बेशुद्ध आकांडतांडवाला रंग कां
चढणार नाहीं ? केसरीकारांनीं दोन मुख्य निबंध लिहून या चोपड्याची नाहक
जाहीरात देण्याचा अव्यापारेषु व्यापार केला नसता, तर त्याच्या जनन-
मरणाची वार्ताहि कोणास कळली नसती. प्रस्तुत प्रसंगी कुळकणींलीला-
मृताचें परीक्षण करण्याचें हें स्थळ नव्हे, जरूर नाहीं किंवा त्याची पाठ
थोपटण्याचे वकीलपत्राहि आम्ही घेतलेले नाहीं; परंतु केसरीकाराने त्याच्या-
बद्दल जो मोठा शिरा ताणताणून गवगवा केला तो मात्र निवळ परांचा
कावळा होय, इतकें मात्र येथें सांगणें जरूर आहे. केसरीकाराचें आकांड-
तांडव, तें पुस्तक प्रेस आक्टाखालीं जप्त करण्याबद्दल त्यांनी सरकाराला
केलेली शालशिष्ट ‘ राष्ट्रीय ' शिफारस आणि कोल्हापूरच्या दारूखान्यांत तयार
झालेल्या ' ब्रह्मद्वेषाच्या ' बेवड्याचा त्यांना लागलेला ठसका पाहून हें भयंकर
प्रकरण काय आहे म्हणून आम्ही हें पुस्तक मुद्दाम आणवून समग्र वाचलें.
सद लीलामृतावर चर्चा करून रा. केळकरांनीं केसरीच्या वाचकांना तर असें
भासविण्याचा प्रयत्न केला की कुळकर्णीलीलामृत पुस्तकानें महाराष्ट्रांतील निर-
निराळ्या जातींचा जणुकाय सत्यानाश करण्याची वेळ आणली; जातिमत्सराच्या
ज्वालामुखीनें पेट घेतला; आणि राष्ट्रीयपणाच्या चबुतऱ्याखालीं या महाग्रंथानें
ज्वालाग्राही बांबगोळ्यांचा ढीग रचून ठेवला. जो कोणी हैं पुस्तक वाचील त्याला
असेंच आढळून येईल कीं केसरीकार म्हणतात तसा भयंकर प्रकार त्यांत कोठेंहि
आढळून येत नाहीं. तें एक नाट्यकलारुक्कुठार, नाटक्याचे तारे, सुदाम्याचे<noinclude></noinclude>
piaw5hw00ttidjytksvi8s66h1tkyeg
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५४
104
111710
235877
2026-08-21T11:41:43Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235877
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५० )
पोहे इत्यादि पुस्तकांप्रमाणेच एक विनोदी पुस्तक असून त्यांत कुळकर्ण्याच्या
लोकविश्रुत चेष्टा वर्णन केलेल्या आहेत. कुळकण्याच्या चेष्टा हरदाससुद्धां
आपल्या कथांतून चमत्कृतीचे विनोदी तिखटमीठ लावून वर्णन करीत आले
आहेत आणि
शोणार शिंपी कुळकर्णी आप्पा ॥
यांची रांगत नकोरे बाप्पा ॥
ही सुप्रसिद्ध उक्ती लहानलहान पोरांटोरांच्यासुद्धां तोंडी असते. पण केसरी-
काराप्रमाणें कुळकर्ण्याच्या कढानें उकळत असणाऱ्या कोणत्याही दीडशहाण्यान
त्या हरदासांवर किंवा पोरांवर १५३ - अ खालीं किंवा १२४ अ खालीं खटला कर-
ण्याची बदसल्ला केव्हांहि दिल्याचें आमच्या ऐकीवांत नाहीं. पण आमचे केसरी-
कार पडले सूक्ष्मदृष्टि आणि त्यांत पडली वकीली दृष्टीची भर. त्यांनीं चटदिशी
शेरा ठोकला - त्यांतील निंदा इतकी उघड व बेलगामी आहे कीं जाति-
जातींत वैमनस्य उत्पन्न करणे हा परिणाम या पुस्तकापासून होण्यासारखा
असल्यामुळें, ' आंग्लनृपकृपेंकरून निर्विघ्न श्रवण घडो' असा जरी आशी-
र्वाद सदर ग्रंथाला ग्रंथकर्त्याने सरकाराकडून मागितला आहे तरी सर -
कारच्या नजरेतून असलें हैं जातिविद्वेषकारक खोडसाळ पुस्तक कितपत सुटेल,
याबद्दल शंकाच वाटते. हा शेरा झाला वर्तमानपत्री निस्पृहतेचा आणि
सत्यप्रियतेचा. पण केसरीकार स्वतः पडले अट्टल प्रगमनशील आणि वाढत्या
बांध्याच्या सहानुभूतीचे. त्यांनी पोक्त विचार केला कीं हा लीलामृतकर्ता
बहकला तर बहकला, पण कसा झाला तरी तो आहे आपला देशबंधू म्हणून
केसरीकाराने शेवटीं एक कळवळ्याची पुस्ती जोडली की " पण एकानें गाय
मारली म्हणून दुसऱ्यानें वासरूं मारावें असें नाहीं, यामुळे
हे लीलामृत १५३ अ - खाली किंबहुना नव्या प्रेस आक्टाखाली
येण्यासारखें निःसंशय आहे तरी तें प्रत्यक्ष जप्त होऊं नये.”
१५३ अ काय, १२४ अ काय किंवा नवा जुना प्रेसआक्ट काय, या सर्वांत आमचे
केसरीकार पुरे डुंबलेले; अर्थात् सरकारची नजर - मेहनत वांचविण्याच्या कामी
त्यांनीं सरकारास दिलेला इषारा राष्ट्रीय नव्हता असें कोणी म्हणावें ? केसरीचे
कोणते कृत्य राष्ट्रीय नसते ? पण या राष्ट्रीय सेन्सारी दृष्टीच्या कक्षेत त्यांची
स्वतःचीं, स्वज्ञातियांचीं व स्वपक्षियांचीं कृत्यें मात्र कधींच सांपडत नाहींत.<noinclude></noinclude>
hcca1rnmeqxnldeynsifywxvnrggfzv
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५५
104
111711
235878
2026-08-21T11:42:04Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235878
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५१ )
स्वज्ञातियांचे ग्रंथ-मग ते कितीहि उघड व बेलगामी निंदेनें भरलेले असोत-
त्यावर सरकारी कायद्याने डोळा फिरवतांच मात्र महाराष्ट्राचा अपमान होतो,
महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इभ्रतीवर वज्राघात पडतो, व अन्यायाचा जुलमांचा कळस
होतो. केसरीकार " मवाळांनों पळू नका " अशीं शिमगा करणारी पुस्तक
मोठ्या प्रेमाने मिटक्या मारमारून वाचतात, त्यावर स्तुतिपाठांचा वर्षाव करतात.
कां ? तर तें राष्ट्रीय-प्रेम- मालेचे सुगंधित पुष्प ! कुळकर्णीलीलामृतासारख्या
शुद्ध विनोदी पुस्तकाबद्दल एवढी कोल्हेकुई करणारी केसरीकार केळकरांची कायदे-
बाज सूक्ष्म राष्ट्रीय दृष्टी, भारत - इतिहास संशोधक मंडळाच्या चतुर्थ अहवालाचे
परीक्षण करतांना कोठें गेली होती ? कुळकर्णीलीलामृत जातिजातींत हटकून द्वेष
उत्पन्न करणारें दिसावें आणि रा. राजवाड्यांचा 'शिवराज - प्रशस्ति व कायस्थ
धर्मदीप ' हा निबंध राजस, गोंडस आणि ऐतिहासिक विद्वत्तेचा काढा वाटावा
यांत त्यांच्या दृष्टीला दोष न देतां, केसरीकंपूच्या राष्ट्रीय महिम्याची खरी खुब्बी
येथेंच आहे, इतकें मात्र स्पष्ट म्हणावें लागतें.

२६. द्वैतभाव आणि मत्सर यांच्या तडाख्यांतून महाराष्ट्राची सुटका करण्याचा
यत्न करण्याऐवजी त्यांना दिवसेंदिवस अधिकाधिक प्रज्वलीत करण्याकडे आम-
च्यांतील मोठमोठ्या शहाण्यासुर्त्या विद्वानांची अक्कल कशी झोकांड्या खाऊं
लागते याचीं वरच्याप्रमाणें उदाहरणें आम्ही देत बसलो तर एक मोठा थोरला
स्वतंत्र ग्रंथच होईल. या बाबतीत लोकधूरिणत्वाचें वीरकंकण हातीं बांधलेल्या
आणि लोकमताला राष्ट्रहितसंवर्धक वळण लावण्याचे पुण्य कृत्य आंगिकारलेल्या
विद्वानांनीच आपल्या मनोवृत्तीत उदारपणाचा भाग अधिक दाखविल्यास त्यांच्या
कर्तबगारीचा खराखुरा आदर बहुजनसमाजांत अधिक वाढेल. द्वैतभावानें आणि
शुद्ध जातिमत्सरानें महाराष्ट्राचे केवढें अनिर्वाच्य नुकसान केलें हें या ग्रामण्यांच्या
इतिहासावरून जबाबदार पुढारलेल्या समाजांनीं जर अझूनहि नीट शिकण्याची
यत्न केला नाहीं, तर इतिहासाचा खरा उपयोग काय असतो हैं उमजण्याची
महाराष्ट्राची लायकीच नाहीं, असें म्हणणें नाइलाजास्तव प्राप्त होईल. आपल्या
पूर्वजांच्या हातून ज्या ज्या घोडचुका घडल्या त्यांचा पुनरुच्चार लौकीकी दृष्टया
कानाला कडू व जिभेला आंबट लागणे शक्य आहे; परंतु ऐतिहासिक महत्वाच्या<noinclude></noinclude>
avenwy7ul1usjwwh06fu3nuoquv15v5
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५६
104
111712
235879
2026-08-21T11:42:20Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235879
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५२ )
दृष्टीनें त्याचा कडूपणा व आंबटपणा आमच्या भावी वर्तनशोधनाच्या काम हेम-
गर्भ मात्रेपेक्षांहि वरचढ गुणकारक ठरल्याशिवाय रहाणार नाहीं.
सध्यां आपण सर्व महाराष्ट्रीयजन उत्क्रांतीच्या काळचक्रांत परिभ्रमण करीत
आहोंत. मागील काळांतील पुण्याईचा वाजवी अभिमान बाळागतांनाच कृत
पापांच्या क्षालनाचेहि कटुकर्तव्य आपण बजाविलें पाहिजे जातिभेदानें आधींच
महाराष्ट्रीय हिंदुसमाजाची घडी विस्कळीत झाली आहे आणि एकीचे चक्रहि
पार खिळखिळे केलेले आहे. पायथ्याशी पडलेला बेकीचा, द्वैताचा आणि
मत्सराचा केरकचरा झाडून साफ करण्यापूर्वी, उच्च वातावरणांतील उच्च कल्प-
नांच्या कोरणीनें सामाजिक वैभवाच्या मनोऱ्याच्या वरच्या भागांवर आपण
कितीहि कलाकुसरीचीं कामें केलीं तरी पायथ्याला भिडलेल्या केरकच-यांतील
झुरळे व वाळवी कधीं ना कधीं तो मनोरा ढांसळून पाडल्याशिवाय खास
रहाणार नाहींत. हिंदुसमाजरूपी विराट पुरुषाच्या मर्मस्थानीं झोंबलेलें
जातिमत्सराचें काळकूट विष राष्ट्रीयत्वाच्या किंवा विश्वबंधुत्वाच्या कोरड्या
गप्पांच्या मलमपट्ट्यांनीं नाहींसें होणें शक्य नाहीं. त्याचें उच्चाटण
करायला कांहींतरीं जालीम रसायन पोटांतच घेणें भाग आहे रोग 'क्रॉनिक '
असल्यामुळे काढ्याचीं बरींच सप्तकें घ्यावी लागतील हॅ निर्विवाद
आहे. अशा प्रकारचा कांहींतरी प्रत्यक्ष प्रयत्न करण्याची हिंदुसमाजाला प्रेरणा
व्हावी व त्यांना निश्चित दिशेनें औषधोपचार करण्यास सुलभ जावें, ह्मणून आम्ही
ग्रामण्याचा साद्यंत इतिहास ' हें रोगाचें तंतोतंत निदान ठरविणारें चिकित्सा-
पत्रक महाराष्ट्रीयांपुढे ठेवीत आहोत. याच्या परिशीलनानें जातिमत्सराचा व
द्वैतभावाचा जुनाट रोग महाराष्ट्रीय हिंदुसमाजांतून अज्जीबात घालविण्यासाठी
एकजुटीने प्रयत्न करण्याची प्रेरणा ती प्रतापगडची श्रीभवानी सर्वांना देवो,
अशी त्या राष्ट्रदेवतेची अत्यंत कळकळीनें करुणा भाकून, लेखणीस कांहीं वेळ
विराम घेण्याची परवानगी देतो.
6
देशबांधवांचा नम्र सेवक,
केशव सीताराम ठाकरे.<noinclude></noinclude>
bmff9fsfrdjayf9g7y015jc983fbf7l
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५७
104
111713
235880
2026-08-21T11:42:35Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235880
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>॥ श्री ॥
ब ४१%
१४८०
ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास.
( चांद्रसेनीय कायस्थ प्रभू . )
ग्रामण्य पहिलें.
तालभूपाळचें ग्रामण्य. ( शालीवाहन शकापूर्वी ६५६ वर्षे.)
मगध देशाचा प्रख्यात क्षत्रिय राजा महापद्मानंद हा मोठा धनलोभी
असल्यामुळे त्यानें आपल्या प्रजेवर अत्यंत भयंकर जुलूम करून पैसा उक-
ळविला. स्वतः क्षत्रिय असूनहि त्यानें इतर क्षत्रियांवर पैशासाठी इतका
पराकाष्ठेचा जुलूम केला कीं, पुराणांतरीं त्याला परशुरामाची उपमा दिली
आहे. त्याच्या अनन्वित जुलमाला त्रासून हजारों क्षत्रिय वीर आपल्या
कुटुंबांसह देशांतरास गेले. त्यावेळीं चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंचीं बरीचशीं
स्थायिक कुटुंबे या प्रसंगी स्वदेशत्याग करून बाहेर पडली. त्यांपैकीं
कित्येक नेपाळांत, कित्येक काश्मिरांत आणि सुमारे ८० कुटुंबे तालभोपाळ
येथें येऊन राहिली. या वेळीं तेथें जुनाट यावनी सत्ता होती. तेथील अधिकारी
यवन खरे, परंतु हिंदु लोकांवर त्यांची दयार्द्रदृष्टी होती. त्या ठिकाणच्या
राजकारणी लोकांच्या सल्लामसलतीनें हीं ऐशीं कुटुंबें तेथें बस्ती करून
राहिली. ही मंडळी राजकारणांत व बुद्धिमत्तेंत चांगली तरबेज
आढळल्यामुळें या ठिकाणीं त्यांना लवकरच उत्तम प्रकारचा राजाश्रय

'इतिहासकारांनी दिलेला हा काळ वादग्रस्त आहे. आद्यशंकराचार्यापासूनचे दहावे
आचार्य विद्याशंकर भारती यांनी या ग्रामण्याचें निराकरण केलेलें आहे. आद्य आचा-
र्यांचा निर्याणकाळ अझून निश्चित झालेला नाहीं. त्यांच्या उपलब्ध कुंडलीवरून तो शा.
श. पूर्वी ९९१ वर्षे ठरतो. प्रत्येक परंपरेची कालमर्यादा अजमासें २० वर्षे धरल्यास विद्या-
शंकर भारतीचा काळ शा. श. पूर्वी ६३१ वर्षे येतो. ह्मणून बखरकारांचा वरील काळ
आम्ही कायम ठेविला आहे. कोणी ज्ञात्यानें या काळाचा निश्चित उलगडा केल्यास त्याचा
आम्ही साभार स्वीकार करूं.<noinclude></noinclude>
12foaopg6ywzls052fegpdof2gpulm9
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५८
104
111714
235881
2026-08-21T11:42:48Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235881
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २ )
मिळाला; आणि महापद्मानंदाच्या जुलमाची स्मृति हळुहळू या नवीन
राजाश्रयाच्या पडद्यामागें अंधुक अंधुक होत गेल्यामुळे या मंडळीनें ताल-
भोपाळास कायमचीच वस्ती केली. परंतु किती झालें तरी गत स्वातं-
व्याचें राजकीय वैभव आणि दर्जा यांचे स्मरण या नवीन सुखावह परंतु
परतंत्र स्थित्यंतरांतसुद्धां त्यांच्या मनोवृत्ति अस्वस्थ केल्याशिवाय राहिलें
नाहीं. गत वैभव पुनश्च कसें प्राप्त होईल ही त्यांची इच्छा केव्हांहि
नष्ट झाली नव्हती आणि त्या दिशेने त्यांचे प्रयत्न सतत चालू होते.
" ठाकरे " या उपनांवाच्या कोणी एका चां. का. प्रभू वीरानें चितोडाजवळ
एक लहानसें संस्थानही स्थापन केलें. यवनी राजकर्त्यांचा लोभ संपादन
करून कोणी जहागीरदार झाले, कोणी सरदार झाले, तर कोणाला लेखन-
वृत्तीवरच निर्वाह करावा लागला. त्यावेळीं बलदेवजी प्रभु व हरि -
लालजी प्रभु हे दोन गृहस्थ मोठे प्रसिद्ध असून या जातीचे पुढारी होते.
राजदरबारांत त्यांचें वजन व मानमरातब मोठा होता. तथापि गतवैभ-
वाच्या तोडीचें याहिपेक्षां उच्च असें राजकीय क्षेत्रांतील स्थान पुनरपि आप-
णांस प्राप्त व्हावें, याकरितां त्या देवभोळ्यांनीं आपल्या कुलगुरुंच्या हस्तें
एक अनुष्टान करण्यास सुरवात केली.
यावेळीं कोणीएक संन्याशी बुवा तेथील कारभाऱ्यांजवळ दानाध्यक्ष
होते. चां. का. प्रभू जातीचे पुढारी बलदेवजी व हरिलालजी अनुष्टान
करीत आहेत हैं वर्तमान त्यांना समजलें. अनुष्ठानाचा प्रयोग मैथिली
होता, त्यामुळे विशेष कांक्षा येण्यास कारण झालें. जारणमारणाच्या
प्रयोगाप्रमाणेंच हाही एक प्रयोग असेल असे वाटल्यामुळे म्हणा किंवा
तशी मुद्दाम कल्पना केल्यामुळे म्हणा, त्या संन्याशानें या प्रकरणाचा फार
बारकाईनें तपास चालविला. परंतु हैं प्रकरण काय आहे याचा स्पष्ट व
प्रत्यक्ष खुलासा खुद्द बलदेवजी किंवा हरिलालजी यांस भेटून करून घेण्याचा
मनाचा मोकळेपणा किंवा धैर्य संन्याशीबुवानें किंवा कोणीहि दाखविलें
नाहीं. चां. का. प्रभू ज्ञातीचे पूर्वापार कुलगुरु रामनाथ नांवाचे मैथिली
ब्राह्मण होते. ते तालभोपाळच्या ८० कुटुंबांचीं सर्व वैदिक कर्मे चालवीत
असत. ते अनुष्टान चालवीत असतांना या संन्याशी बुवानीं व त्याच्या<noinclude></noinclude>
8m2nu9z2cj56qk59keuljhbeghuft9a
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/५९
104
111715
235882
2026-08-21T11:43:03Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235882
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३ )
इतर हस्तकांनी " यवनराजा तुम्हांस धरून नेणार आहे " अशी भीती
घातल्यामुळें अनुष्ठानाचें कार्य अर्धेच टांकून गुरुजीबाबा आपल्या संगिया
गांवीं निघून गेले व अनुष्ठानास बसलेले इतर ब्राह्मणही पळून गेले ! मात्र
जातांना रामनाथ गुरुजीनीं आपली पुरोहित - वृत्ति व अनुष्ठान आपल्या तीन
शिष्यांकडे सोपविले. त्यांत रामनारायण हा शिष्य मोठा विद्वान् असून
अनुष्ठान - प्रयोगांतहि मोठा हुषार होता व त्याचा प्रभुज्ञातीवर लोभही
होता. मध्यंतरीं संन्याशीबुवाने कारभान्यामार्फत यवनराजास कळविलें
की राज्याच्या अभिलापानें बलदेवजी व हरिलालजी यांनीं अनुष्ठान कर-
ण्यास सुरवात केली असून स्वामीस अपाय करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
संन्याशी कधि खोटें बोलतो ? झालें. यवनाधिपतीनें रामनारायणादि
तीनही ब्राह्मण शिष्यांस ठार मारून टाकण्याचा हुकूम फर्माविला. ही गोष्ट
रामनारायणास समजतांच त्यानें शिखासूत्रांचा त्याग करून संन्यास घेतला
व चंद्रेश्वर स्वामी हें नांव धारण केलें. तेव्हां यवनेश्वरानें हुकुम रद्द केला.
स्यावर बलदेवजी व हरीलालजी हे यवनाधिपास जाऊन भेटले आणि त्याची
नीट समजूत करून सांगितलें कीं, "हें अनुष्ठान यजमानांच्याच कल्याणा-
करितां आम्ही करीत आहोत.” भोपालेश्वरानें पुष्कळच बारकाईने तपास
करून पाहिलें, परंतु बलदेवजी व हरिलालजी या उभयतांचेच म्हणणें
शेवटीं खरें ठरलें आणि संन्याशी बुवांची लुडबुड उघडकीस आली.
यवनाधिपानें बलदेवजीला
अनुष्ठान अव्याहत चालवावें
असा हुकूम
सोडला. रामनारायण यानीं आधींच संन्यास घेतल्यामुळे त्याच्या शिष्य-
वर्गानें अनुष्ठानाची समाप्ती यथासांग केली.
66

बलदेवजी प्रभृतींना हाणून पाडण्याच्या कारस्थानांत स्वतःच पालथे
पडण्याचा उलटा प्रसंग आल्यामुळे, संन्याशीबुवांच्या मनाला मोठाच
पीळ पडला. दिवसेंदिवस बलदेवजी व हरिलालजी यांचें वजन दरबारांत
फारच वाढूं लागलें व ते मोठ्या हुद्यावरहि चढले. त्यांच्यापुढे कोणाचेंच
तेज पडेनासें होऊन भोपालेश्वर यवनराजा त्यांच्या सर्वस्वीं अंकित झाला.
सर्व बाजूंनी हताश झाल्यावर सरतेशेवटीं भटा तुझें वर्म काय तर
सुताचें जानवें, या न्यायाची कांस धरून संन्याशीबुवानीं चां. का.
.<noinclude></noinclude>
bi29xcbxyox67v535mfg9uu4zjz6pxo
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६०
104
111716
235883
2026-08-21T11:43:23Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235883
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( 8 )
प्रभूंवर ग्रामण्य उभे केलें. हेंच पहिलें ग्रामण्य होय. राजकीय क्षेत्रांतील
स्पर्धेमध्यें प्रतिपक्षाचा पाडाव करण्याच्या कामी स्वतःची कर्तबगारी क
बुद्धिमत्ता कुचकामाची ठरल्यावर निदानीचा उपाय म्हणजे धार्मिक हक्कांचा
प्रश्न उभा करून कायस्थ प्रभूंचा सामाजिक दर्जा कमी प्रतीचा ठरविण्यांत
बुद्धी सर्वस्व खर्च करण्याच्या ( म्हणजेच ग्रामण्य उभारण्याच्या ) कल्पनेचा
अग्रमान या संन्याशीबुवांचा आहे. हें ग्रामण्य शालिवाहन शकापूर्वी
६७१ या वर्षी सुरूं झालें व तें सुमारें १५ वर्षे चाललें होतें. चां. का.
प्रभु व त्यांचे पुढारी बलदेवजी व हरिलालजी हे खरे क्षत्रिय नव्हत व
त्यामुळे त्यांना वेदोक्त कर्मे करण्याचा अधिकार नाहीं असा आरोप
करून, प्रभु ज्ञातीची धर्मकृत्यें वैदिकमंत्रानें चालविणाऱ्या रामनारायणाच्या
तीन ब्राह्मण शिष्यांस त्या संन्याशीबुवानी बहिष्कृत केले. याचा निकाल
लावून
घेण्यासाठीं बलदेवजी व हरिलालजी हे काशीस गेले. तेथें यावेळी
श्री विद्याशंकरभारती शंकराचार्यस्वामी यांचा मुक्काम होता. त्यांची
खात्री करून देऊन त्यांना घेऊनच दोघे तालभोपाळास परत आले.
शालिवाहन शकापूर्वी ६५६ व्या वर्षी श्रीमत्शंकराचार्य श्री विद्या-
शंकरभारती हे तालभोपाळास आले.
रामनारायणाचे तीन शिष्य अपंक्त पडतांच त्यांनींही मोठी खटपट
चालविली होती. श्रीशंकराचार्यांची स्वारी येतांच त्यांनी मोठी सभा
भरविली. या सभेंत पुष्कळच भवति न भवति झाली; परंतु दानाध्यक्ष
संन्याशीबुवा यांचा दुराग्रह कांहीं केल्या सुटेना. श्रीमज्जगद्गुरुंनी पुष्कळच
समजूत घातली, पण बुवा ऐकेनात. तेव्हां त्या तीन अपंक्त शिष्यांस
आपल्या बरोबर पंक्तीस भोजनास घेऊन स्वामीनीं वाद मिटविला. खुद्द जग-
गुरुनींच त्यांना आपल्या पंक्तीला घेऊन भोजन केलें तेव्हां सगळा बखेडा
आपोआपच मिटला गेला. याप्रमाणे या पहिल्या ग्रामण्याचा शेवट झाला..<noinclude></noinclude>
csmipruz2oll1kht0itqc2wnqsrd5r7
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६१
104
111717
235884
2026-08-21T11:43:37Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235884
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ५ )
ग्रामण्य दुसरें.
जोगाईच्या आंब्याचें ग्रामण्य. (शके १३९१ इ. स. १४६९).
जोगाईचें आंबे उर्फ आंबेजोगाई हें गांव निजामसरकारच्या राज्यांत
औरंगाबाद प्रांतांत परभणी परगण्यांत गोदावरी नदीच्या कांठीं आहे.
मुसलमानींत यास " मोमीनाबाद" असें नांव होते. यावेळी हसन
गंगूच्या बाहामनी वंशांतील दुसरा सुलतान महमंदशहा ( सन १४६३-
८२ ) हा राज्यावर होता. महमंद गवान या नावांचा त्याचा वजीर मोठा
कर्तबगार माणूस होता. यावेळीं -

अष्ट दिशा व्यापून पृथ्वीवर यवनच जाहले. त्याजवर मंडणमिश्र यांणीं जैनमत
स्थापून सर्व याती कर्मभ्रष्ट केल्या, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र याती उपयाती
यांत वर्णवर्णाची रीत राहिली नाहीं. यवनांची सद्दी चालल्यावर तीन चारशे वर्षे
अजमास भ्रष्टाकार जाहला. किंचित् आपले धर्म चालले. नंतर श्रीशंकरावतार
शंकराचार्य प्रगट होऊन जैनमत खंडण केलें. व मंडणमिश्राशी वाद घालून
त्यास जिंकोन धर्मस्थापना केली. तेव्हां ब्राह्मण इत्यादि याती आपलाले पूर्वधर्म
शास्त्रयुक्त चालवू लागले. तेव्हां चांद्रसेनीय कायस्थ प्रभु आपल्या धर्मे चालत
होते. ते समयीं कोणी शास्त्रविहीन आग्रही ब्राह्मणांनीं द्वेष वाढवून चांद्रसेनीय
कायस्थांस वेदाधिकार नाहीं, ह्मणोन कर्ममार्गास अडथळे केले. सावित्रीपासोन मंडण-
गडपर्यंत तट घालोन खटले करूं लागले. तेव्हां कोकणप्रांती हरी घोलकर *
प्रभु प्रमुख व आणखी प्रभुगृहस्थ व ब्राह्मण मिळोन भांडत मोंगलाई अमलदार
याजवळ गेले, तो यवन अधिकारी होता. तो बोलला जे, तुमचे शास्त्रप्रकरणांत
आम्हांस माहितगारी नाहीं. तुमचें हिंदूचें क्षेत्र श्री वाराणसी. तेथे जाऊन निश्चय
करून आणाल त्याप्रमाणें आम्ही चालवू.
श्री वाराणशी क्षेत्रास जाऊन क्षेत्रस्थानों मोठेमोठे पंडित शास्त्री ब्राह्मण विद्वान
महासमर्थ यांप्रति प्रार्थना केली आणि आपलाल रीतीनें ग्रंथ समजाऊन
त्याजवरून कांहीं ब्राह्मण व प्रभु मंडळी
इतिहासप्रसिद्ध बाळाजी भावजी चिटणीस [ निसबत छत्रपति शिवाजीमहाराज ]
त्यांचे हे पूर्वज होत.<noinclude></noinclude>
6dmcetbys18n6f6v32f7ysyj1agqh25
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६२
104
111718
235885
2026-08-21T11:43:50Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235885
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ६ )
वर्तमान सांगितलें. तेव्हां श्रीपाद गुरु गोविंदभट्ट महाविद्यावंत होते.
त्यांणीं वाराणशींत मणिमुक्त मंडपों समस्त पंडित मंडळी मिळवून सभा केली.
शास्त्रमतें वादप्रतिवाद भवति न भवति होतां, प्रभु हे चांद्रसेनीय कायस्थ
क्षत्रियवंश खरे. याती शुद्ध यांस त्रिविध कर्मै षोडश संस्कार वेदा-
धिकार आहेत. असा शास्त्राधार स्थापून सर्व ब्राह्मणांची समजूत जाहली...
नंतर ब्राह्मण कर्ममार्ग चालवणे यास मान्य जाहले, तेव्हां सर्व शास्त्रांचीं व
पुराणांतरींचीं मर्ते पाहून " गोविंदभट्टी " ग्रंथ करून दिल्हा. नंतर ते संन्याशी
जाहले. गोविंदभट्टीमध्यें तीन कर्मों, चौल उपनयन समावर्तन
इत्यादि षोडश संस्कार चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांसीं वेदाधिकार
गायत्रीचा उपदेश करावा, असें आहे. महारुद्रादि अनुष्ठानें ब्राह्मणद्वारा
करावीं. वैदिकमंत्रे नानाशांति, होम हवनें, विधियुक्त श्राद्धपक्षीं चरुपिंड--
प्रदानें इत्यादि करावीं. असें चांद्रसेनीय प्रभूंस पहिले धर्म चालवून दिल्हे.
त्यांत कांहीं आक्षेप न घेतां चालवावे. असे सर्व ब्राह्मणांस सांगितले व प्रभुमंड
ळीस सांगितलें जे, तुम्हांस शास्त्रमतें वेदकर्मास व षोडश संस्कारांस
अधिकार आहे. त्याअन्वये प्रस्तुत गोविंदभट्टी * हा ग्रंथ करून दिल्हा आहे.
तरी रेणुका माहात्म्यांतील व्यासोक्ति श्लोकः—
सदाचारपरा नित्यं रता हरिहरार्चने ।
देवविप्रपितणां वै अतिथीनां च पूजकाः ॥ १ ॥
यज्ञदानतपःशीला व्रततीर्थरता ः सदा ।
गर्भाधानं पुंसवनं सीमंतो जातकर्म च ॥ २ ॥
दान एकूण तीन कर्मे करावयास
करवावें असें ब्राह्मणांस सांगोन
येणेंप्रमाणें संस्कार व यजन अध्ययन व
अधिकार शास्त्रमतें सांगोन आचरण करावें व
खटला मोडिला तेसमयीं प्रभुमंडळी यांणीं गुरुदक्षणा आपले ज्ञातीचें गुरुत्व.
दिल्हे. नंतर ते संन्याशी जाहले. त्यांचे शिष्ये तीघेजण होते. ते असामी:-
4

गोविंदभट्टीस " कायस्थ पद्धति असें नांव आहे. या ग्रंथांत कित्येक लबाड क
कुमांडी ब्राह्मणांनीं अलीकडे फेरफार व घुसडाघुसड केली असल्याचे समजतें.<noinclude></noinclude>
9hacnf6zhchu13lesqipxnmdb9kk7o8
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६३
104
111719
235886
2026-08-21T11:44:04Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235886
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ७ )
१ महाबलेश्वर करवे, १ वटेश्वरभट, १ दिनकरभट्ट टकले.
एकूण तीन ब्राह्मण देशस्थ त्यांजपाशीं शिष्यत्व करून होते. ते सर्वत्र प्रभु
मंडळीस गुरु, आपली प्रतिमा करून देऊन सदहूप्रमाणे तीन कर्मों व षोडश
संस्कार वेदोक्त मंत्र चालवावयास सांगोन गोविंदभट्टी ग्रंथ समागमें देऊन
वाराणशीहून दक्षिणेस, प्रभुमंडळी व ब्राह्मण समुदाय गेले होते त्यांची रवानगी
जाहली. त्यासीं अजमासे वर्षे आठ साडेआठशे * जाहलीं ते दक्षिणेस आले. यावर
जागजागचे अमलदारांस व ब्राह्मणांस हें वर्तमान सांगितलें. तेव्हां त्यांणी सर्व
ब्राह्मणांस सांगितले जे, वाराणशीहून निश्चय होऊन आला त्याप्रमाणे प्रभु चांद्रसे-
नीय यांचे धर्म संस्कार चालविणें त्याजवरून गोविंदभट्टीचे अन्वयें चालवू लागले.
याप्रमाणें हें दुसरें ग्रामण्य निकालांत आलें.
ग्रामण्य तिसरें.
जुन्नर किंवा विजापुरचें ग्रामण्य (शके
१५८५ सन १६६३). †
या ग्रामण्याचें नक्की साल उपलब्ध नाहीं. रा. रामराव नारायण प्रधान
यांच्या मतें "हें जें विजापुरचें ग्रामण्य म्हणवितें तें असावें." याची कांहींच

*ची का. प्रभूंच्या इ. साधनें यांत प्रसिद्ध झालेल्या " कायस्थ प्रभूंची बखर
यांतून वरील उतारा घेतला आहे. ही बखर शके १७१७ सन १७९५ त लिहिलेल्या
अस्सल पत्राच्या आधारानें लिहिलेली आहे.
+ ( १ ) " पूर्वी ग्रामण्य शके १३९१ सालीं झालें. त्या समई टकले यांनीं निराकरण
केलें. जोगाईच्या आंब्याचे ठिकाणी. '

प्रभुकुलदीपिका, पृ. १५२.
(२) “पूर्वी ग्रामण्य जोगाईचे आंब्यास जालें, शके १३९१. ते समई निळकंठ गुरु गोसावी
योनीं काशीस जाऊन शंकराचार्य आणून समाधान केलें

रा. राजवाडे कृत म. इ. सा. खंड ६ लेखांक ४४४-

+ ग्रामण्याच्या कोणत्याच यादींत या ग्रामण्याचे साल दिलेलें नाहीं. शके १७१७ त
लिहिलेल्या बखरींत " अजमासें १३२ वर्षे झालीं असें स्पष्ट लिहिलें आहे. शिवाय
कमळाकर भट्ट हे गागाभट्टाचे बंधु असून सन १६६८ त हयात होते. त्यावरून या ग्राम-
ण्याचें साल शंके १५८५ सन १६६३ असावें असें वाटतें व म्हणूनच तें वर दिले आहे.<noinclude></noinclude>
hbqryih07eeqif65b46adghwhkfr40s
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६४
104
111720
235887
2026-08-21T11:44:37Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235887
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>हकिकत उपलब्ध नाहीं.
ण्याचा उल्लेख केला आहे
( ८ )
कायस्थ प्रभूंच्या बखरींत जुन्नरच्या ज्या ग्राम
त्यावरून पाहतां जुन्नरचें ग्रामण्य तेंच विजापुरचें
ग्रामण्य असावें असें वाटतें. या ग्रामण्याबद्दल प्रभुकुलदीपिकाकार
म्हणतात नुलकर काशीस जाऊन निराकरण करून शंकराचार्यांची पत्रें
घेऊन आले.” बखरींत हकिकत आहे ती अशी:-
66

अविंधराज्य यामुळे सर्व जातीचे मलिन आचार. ब्राह्मण यातीत भक्षाभक्ष
करण्यांत विधिनिषेध मानीत ना, तेव्हां कोणी भटोबादीक्षित वाराणशी क्षेत्रीं
गेले. तेथें शास्त्रविचार पाहतां कलियुगीं यज्ञाशिवाय हीन कर्मे मांसभक्षण
नसावे. असें पाहून दक्षिणदेशीं ब्राह्मणांस असें सांगून वर्तवू लागले. त्यापासून
दक्षिणदेशींचं ब्राह्मण नर्मदे अलिकडील चालवू लागले. नर्मदा उत्तरतीरींचे
ब्राह्मण ऐकेनात. ते अद्यापि सामवेदाध्ययन व व्याकरण शास्त्राध्ययन मांसाहार
करितात. दक्षिणेंत भटोबा दीक्षितांनी आचार करविला त्यापासून शुद्ध आचरणें
चालवू लागले. त्यास चारशे वर्षे अजमायें जाहलीं. त्या अन्वयें प्रभुमंडळीही
आचरावयास लागली. मध्ये जुन्नरप्रांती कोणी ब्राह्मणांनी ग्रामण्य केलें. तेव्हां
प्रतिष्ठितांनीं आणि क्षेत्रस्थ पंडित शास्त्री यांहीं शास्त्रविचार पाहून मौंजीबंध-
नादि संस्कार प्रभुमंडळी चांद्रसेनीय कायस्थांस आहेत, असें बालबोध शास्त्रोक्त
पत्र लिहून शक व संवत्सर मिती घालून जुन्नरकर जोशी यांस पाठविलें. त्याप्रमाणे
तेथें संस्कार कर्मों चालली. त्यास वर्षे अजमासें १३२ जाहलीं. † त्याच कारकिर्दीत
कमळाकरभट्टजी याणीं काशीमध्ये शूद्रकमळाकर ग्रंथ, सर्व पुराण
शास्त्रांतील सम्मतें पाहून केला. त्यांत चांद्रसेनीय कायस्थ क्षत्रिय प्रभु यांची
उत्पत्ति लिहिली आहे.
66
जालें,

प्रमुकुंलदीपिका पृ. १५३
दुसरें ग्राम कोंकणांत जालें. ते समयीं काशीस जाऊन पत्रे आणून निराकर्ण
शक-

रा. राजवाडे कृत म. इ. साधनें, खंड ६, लेखांक ४४४.
↑ शके १७१७ पूर्वी चारशे वर्षे म्हणजे शके १३१७.
+ शके १७१७ पूर्वी १३२ वर्षे म्हणजे शके १५८५.<noinclude></noinclude>
09kf7na6lbn4ob6pe0y4fkpw3mffaz1
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६५
104
111721
235888
2026-08-21T11:44:53Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235888
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ९ )
कै. ना. न्यायमूर्ती का. त्रि. तेलंग, हे " मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष "
( पृ० १६० ० ) येथें ह्मणतात:-
66

6
कायस्थ प्रभूंची बखर वाचली ह्मणजे असें सिद्ध होतें कीं वेळोंवेळीं
विजापूर येथील मुसलमानी राजांच्या हिंदुप्रजेमध्ये तंटे होत; तेव्हां
त्यांचा निकाल करण्याकरितां राजांची मदत ते लोक घेत असत.
उदाहरणार्थ, कोंकणामध्ये ब्राह्मण व प्रभु यांचा तंटा लागला तेव्हां दोन्ही
बाजूंचे लोक विजापूर येथील मुसलमान सुभेदाराकडे दाद मागण्या-
करितां गेले, तेव्हां तो म्हणाला आपण मुसलमान आहों तुमच्या
शास्त्राचें आम्हांस बिलकूल ज्ञान नाहीं; उत्तम मार्ग म्हटला म्हणजे,
तुम्ही आपलें मुख्य पवित्र स्थान जें काशी क्षेत्र तेथें जावें, व तेथील
पंडितांकडून आपल्या तंट्याचा निकाल करून घ्यावा. निकाल अमलांत
आणणें आपलें काम. तें आपण करूं ' असें त्यानें वचन दिलें. बखरींत
पुढें असा मजकूर आहे कीं, दोन्ही बाजूंचे लोक खरोखरच काशीस गेले.
तेथें पंडितांची मोठी सभा भरविली व पुष्कळ वादविवाद होऊन अखेरीस
असा निर्णय झाला कीं प्रभूलोक मूळचे अस्सल क्षत्रिय आहेत,
वेदांत सांगितलेली कर्मे करण्याचा त्यांना अधिकार आहे व
गायत्री मंत्र ह्मणण्यासही ते अधिकृत आहेत. तेव्हां ब्राह्मणांचे
समाधान झाले व नेहमीप्रमाणें प्रभूलोकांकरितां वेदकर्मे करण्याचे त्यांनी
कबूल केलें. याप्रमाणे सर्व व्यवस्था चालली. अशा रीतीनें हें तिसरें
ग्रामण्य समाप्त झालें.
ग्रामण्य चौथें.

रायगडचें ग्रामण्य ( शके १५९९, सन १६६९ ).
शिवाजी महाराजानीं महाठी स्वराज्याचें कंकण हातांत बांधून अत्यंत
अल्पावकाशांत दख्खनमधून मुसलमानी सत्तेचें उच्चाटन करून स्वराज्याच्या
जरीपटक्याबरोबरच स्वधर्माचा झेंडा उच्च फडकावला. या इतिहासप्रसिद्ध<noinclude></noinclude>
eyerffsgc6kocdqystmgkkrl9tj4imq
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६६
104
111722
235889
2026-08-21T11:45:08Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235889
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १० )
त्याचा पराक्रम
मराठे राज्य-
राष्ट्रीय कामगिरीत साह्य करणारीं जीं जीं प्रमुख कर्तृत्ववान् माणसें यदृच्छेनें
शिवाजीला लाभली त्यांत बाळाजी आवजी चित्रे चिटणीस हे अग्रगण्य होत.
बाळाजीच्या अचाट बुद्धिमत्तेच्या तोडीचा पुरुष फक्त तोच.
जितका व्यापक तितकी त्याची स्वामीभक्तीहि अभंग होती.
कर्त्यांच्या व पेशव्यांच्या अमदानींत स्वपराक्रमानें उदयास आलेलीं सगळ्या
महाराष्ट्रांत जितकीं घराणीं आहेत, त्या सर्वांत चिटणीसांच्या घराण्याचा
स्वामीभक्तीमध्यें पहिला नंबर आहे. या घराण्यांतील प्रत्येक पुरुषानें-
प्रसंगोपात् स्त्रियांनीसुद्धां - आपल्या स्वामीभक्तीची कमाल करून शेवटपर्यंत
मराठी राज्याची मोठ्या इमानदारीनें सेवा केली. पिढ्यानपिढ्या एकसारखें
स्वामीसेवेचें व्रत एकनिष्ठेने पाळणारें एकादें घराणें महाराष्ट्राच्या किंवा हिंदु-
स्थानच्याच काय, पण जगाच्या इतिहासांत तरी असें सांपडेल किंवा नाहीं
याची शंका आहे. निष्कपट स्वामीभक्ती, कडकडीत निस्पृहता, अचाट
बुद्धिमत्ता, टापटिपीचा कारकुनी बाणा आणि बिनचूक धोरणी दृष्टी या विशेष
गुणांच्या योगानें शिवाजीमहाराजांना बाळाजी इतका प्रिय झाला होता कीं
'बाळाजी माझा प्राण " असें त्यांनीं वारंवार म्हणावें. बाळाजीच्या सल्ला-
मसलतीवाचून महाराजांचें कोणतेंही राजकारण होत नसे. मूर्ती दोन पण
कृती एक ; आचार विचार एक ;
याप्रमाणें महाराज व बाळाजी यांची
जोडी यदृच्छेनें एके ठिकाणी मिळाली व तिनें आपल्या संयुक्त कर्तबगारीनें
सर्व हिंदुस्थान हालवून सोडलें. बाळाजीच्या सल्ल्यावांचून राज्यांत
पानही हालेना. दरबारांत बाळाजीचें वजन व वचक फार वाढला.
बाळाजीपुढें अष्टप्रधान व सरदार इत्यादिकांचें तेज मुळींच पडेना !
बाळाजीच्या बुद्धिमत्तेपुढे वेळोवेळीं सर्वांना खाली मान घालावी लागे.
अशा प्रकारें वारंवार तेजोभंग होऊं लागल्यामुळे पेशवे वगैरे ब्राह्मण सरदा-
रांच्या मनांत बाळाजीबद्दल वैषम्य उत्पन्न झालें व ते आंतून त्याचा द्वेष
करूं लागले. परंतु महाराजांची बाळाजीवर विशेष कृपा असल्यामुळें व ते
त्याच्या संरक्षणास सदैव तत्पर असल्यामुळे बाळाजीचा एक केंसही
वांका करण्याचे धैर्य कोणास होईना ! एकदां तर बाळाजीला विष-
प्रयोगहि करण्याचा प्रयत्न या मत्सरी दरबारी मंडळीनें केला. परंतु
66
'<noinclude></noinclude>
8lenig6r1jwaxqjtmpwd2njykw01tmx
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६७
104
111723
235890
2026-08-21T11:45:23Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235890
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ११ )
बाळाजीच्या धूर्ततेनें व महाराजांच्या दक्षतेनें तो दुष्ट बेत सिद्धीस गेला
नाहीं. अशा प्रकारें बाळाजी व दरबारी मंडळी यांचा द्वेष दिवसानुदिवस
वाढत गेला. या संबंधानें रा. ब. बा. आ. गुप्ते यांनी चां. का. प्रभूंच्या
इतिहासाची साधनें नामक मासिकांतील " ग्रामण्याच्या हकिकतीं " त
उल्लेख केला आहे तो असाः-
बाळाजी आवजी चिटणीस चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांजवर महाराजांचा
पूर्ण लोभ, व यांचॆं निष्ठेनें वागणें होतें, व राज्यकारणाचे व राज्य साधण्याचे प्रसंग:
हरवक्त चालू होते. तेव्हां राज्यकारणी लिहिणें चिटणीसी, त्यांत विश्वासू, कल्पक,
कर्तेपणा व स्वामिलोभ यामुळे सर्व राज्यकारण संस्थानिकांकडील बोज ठेवून
सर्वाध्यक्षपणे वागूं लागले. यामुळे पेशवे यांचे वागणें तेज कमतर सहजी जाहलें.
चिटणीसीस कारभार, गुप्तपणा व एकांत सहजी येतो; तो होऊं लागल्यामुळे
पेशवे व कारभारी मंडळ यांस वैषम्य वाटून द्वेषास प्रवर्तक झाले. परंतु कार-
भारांत वगैरे अकलेनें चिटणीस यांस माजी करावें ही आक्रमणशक्ति नाही.
खावंद सूज्ञ जबरदस्त यामुळे न चाले.
याच सुमारास दुसरी एक अशीच महत्वाची परंतु विषादकारक गोष्ट
घडून येत होती. आणि बाळाजीसारखा तडफदार दृढनिश्चयी माणूस
जर त्यांत मन न घालता तर मराठी राज्यसंस्थापना ही गोष्टच स्वप्नवत्
झाली असती. शिवाजीमहाराजांचे वडील शहाजी हे एक त्या काळचे
मोठे मातबर उमराव होते व त्यांना विजापूरच्या सुलतानाकडून राजा हा
किताब मिळाला होता; इतकेंच नव्हे तर शहाजीराजे त्या वेळचे " किंग-
मेकर " च होते, असा सर्व स्वदेशी विदेशी इतिहासकारांचा एकमताचा
अनुवाद आहे. शिवाजीमहाराज स्वराज्यसंस्थापनेचा उद्योग करीत होते
हें खरें, पण त्यांचे कूळ म्हणजे केवळ एका बड्या सरदाराचें असून
त्याच्या तोलाचीं दुसरींहि पुष्कळ मराठ्यांची घराणीं त्यावेळी अस्तित्वांत
होतीं. त्यांपैकीं ज्या कांहीं थोड्या मराठे सरदारांनीं शिवाजीस साह्य केलें
होतें ते त्यास आपला पुढारी मानीत होते आणि राजकारणप्रसंगी जेव्हां
तो उच्चासनावर बसे तेव्हां ते त्याला मुजरेही करीत. परंतु शिवाजीच्या
कर्तबगारीची किंवा तिच्या ऐतिहासिक महत्वाची खरीखुरी जाणीव त्यांना
18 APR 1990<noinclude></noinclude>
rvxv8vx1c58pftlzysht115lqeaw69g
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६८
104
111724
235891
2026-08-21T11:45:38Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235891
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १२ )
न झाल्यामुळे, केवळ वजनदार सरदारकीच्या समानतुल्य भावनेमुळें,
शिवाजीपुढें वांकून मुजरे करण्याच्या कामी त्यांची संकोचवृत्ति वारंवार
आड येऊ लागली, त्यांची शुद्ध मनें दिवसेंदिवस गढूळ होत चालली
आणि कित्येकांनी तर शिवाजीच्या दरबारास हजर राहण्याची टाळाटाळ
चालविली. दूरदर्शी शिवाजीमहाराज व तीव्रबुद्धी बाळाजी यांनी ही गोष्ट
प्रथमपासूनच ताडली होती व या गोष्टीला काय उपाय करावा याबद्दल
उभयतांच्या गुप्त मसलतीही चालल्या होत्या. त्यांत बाळाजीनें महाराजांस
असें समजाविलें कीं, " पायाशुद्ध* राजगादीची स्थापना करून राज्याभिषे-
कानें महाराज हैं पद आपण प्राप्त करून घेतल्याशिवाय या लोकांची तोंडें
बंद व्हावयाचीं नाहींत. " बाळाजीचें म्हणणें सप्रमाण, अर्थात् तें महारा-
जांस तेव्हांच पटले आणि त्यांच्याच अनुमतीनें बाळाजीनें हा प्रश्न दरबा-
रांत उघडउघड काढून त्यावर चर्चा केली. त्यावेळीं क्षत्रियाशिवाय
इतरांस राज्याधिकाराचा हक्क नाहीं, असें म्हणून पेशवे पंडितराव वगैरे
ब्राह्मणांनी व मराठे सरदारांनीं त्याचा निषेध केला. शिवाजी महाराज
शूद्र असतां त्यांस राज्याभिषेक करणें म्हणजे धर्मच बुडविणें होय, असें
निक्षून सांगून त्यांनी बाळाजीचें म्हणणें अगदींच फेटाळून लाविलें आणि
धर्माच्या पोकळ सबबीखालीं आपल्या अंतःकरणाचा पोकळपणाहि व्यक्त

* ऑन० किंकेड साहेब आपल्या अभिनव इंग्रजी " महाराष्ट्राचा इतिहास' पृ० २४४
वर येणेंप्रमाणें स्पष्ट खुलासा करतात:- :-“ For_although the high-spirited
Deccan nobles gladly followed Shivaji in the field, they were an-
willing in private life to concede to him any precedence. And at
etate dinners they resented that a Bhosle should sit on a seat raised
above those assigned to Mohites, and Nimbalkars, Savants and
Ghorpades. He spoke of the matter to his secretary, Balaji Abji
Chitnis, and the latter urged him to take the royal crown from the
hands, not of a Moghal emperor, but of a Benaras priest. The King
consulted his mother Jijabai, the saintly Ramdas and his favourite
goddess Bhavani and found them all favourable to his secretary's
· suggestion.”<noinclude></noinclude>
k60scwx10rrmox1269h2e2dmkgkejqi
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/६९
104
111725
235892
2026-08-21T11:45:51Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235892
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १३ )
केला. बाळाजी आपल्या बुद्धिचातुर्यानें सर्वोस निरुत्तर करीत होता
परंतु शेवटीं ब्राह्मणांनी हेका धरून आपला हट्ट शेवटास नेला. या कामी
महाराजांचे मुख्य प्रधान पेशवे मोरोपंत पिंगळे हे विरुद्ध पक्षाचे
अध्वर्यू होते. काय वाटेल तें होवो महाराजांस विधियुक्त राज्याभिषेक
करवीनच असा आपला दृढनिश्चय बाळाजीनें तर स्पष्ट बोलून दाखविला.
तेव्हां पूर्वीच्या मत्सरांत अधिकच भर पडली व द्वेषाग्नीच्या ज्वाला
भडकूं लागण्याची स्पष्ट चिन्हें दिसूं लागलीं. निश्चयी बाळाजी म्हटल्या-
प्रमाणें केल्यावांचून राहणार नाहीं हें मात्र त्याचे प्रतिस्पर्धी जाणून होते.
राजकीय वातावरणांत होत असलेल्या फेरफारांच्या योगानें ज्या मोठ-
मोठ्या भानगडी उत्पन्न होत त्यांत बाळाजीवर वर्चस्व करण्याची ताकद व
धैर्य त्याच्या प्रतिस्पर्ध्यात नसल्यामुळे शिवाजी महाराजांच्या दरबारी मंड-
ळांत दुफळी पडली. एका बाजूला शिवाजी व बाळाजी आणि दुसऱ्या
बाजूला प्रधानमंडळ व मराठे सरदार. उभयपक्षी स्पर्धा चाले पण बाळा-
जीच्या प्रतिपक्षाचा द्वेष मात्र भयंकर वाढूं लागला. इतक्यांत बाळाजीनें
स्वतःच्या मुलांच्या मुंजी करण्याचे ठरवून समारंभ सुरू केला.
तेव्हां ब्राह्मण्याचें बल काढून ग्रामण्य करण्यास प्रारंभ केला. बाळाजी
चिटणीस यांचे पुत्र जेष्ठ आवजी बाबा म्हणोन होतें, त्यांचा व्रतबंध करा-
वयाचा त्या समयीं पिंगळे यांणी ब्राह्मणांकडून कुचेष्टा करून बोलणें घातलें
जे, तुम्ही क्षत्रिय म्हणोन तीन कर्मे करीत आला व करितां त्यास कलीत
क्षत्रिय नाहीत. तेव्हां तुम्ही क्षत्रिय कोटील व ब्राह्मणही तुम्ही नव्हे त्या
अर्थी मुंजी करूं नये. करूं देणार नाहीं. त्याजवरून चिटणीस यांणी
सांगून पाठविलें कीं, कारभारसंबंधीं द्वेष, त्यास कामानिमित्तें सरकार कल्याणाची
चाकरी करून आम्हांस माजी करून हात दाखवावा. तें सोडून ब्राह्मण्यावर
येऊन सांगून पाठवितां हें आश्चर्य आहे. पूर्वीपासून वेदोक्त तीन कर्मों आचरण करीत
आलों आहों व ब्राह्मण करीत आले.
नाहींत म्हणतां हैं, रिकामे दांत खाऊन
वरकड मार्गे करीत आलों. पुढेही होईल.
नवीन आहे असें नसतां कळींत क्षत्रिय
अवलक्षण देणें चांगलें दिसत नाहीं..
तुम्हीच एक ब्राह्मणांत अध्वर्यु आणि<noinclude></noinclude>
pqer71cqozu0c8qte0zkki7s52k3nyj
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७०
104
111726
235893
2026-08-21T11:46:05Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235893
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १४ )
तुमचेच हुकुमांत सारे ब्राह्मण आहेत असें नाहीं.
आहेत. शास्त्रग्रंथ लटके होतील असें घडणार नाहीं.

बहुत थोर ब्राह्मण पुष्कळ
लटिका कलह वाढवू नये.
परंतु या उत्तराने पेशवा व त्याचे पक्षपाती यांचा दुराग्रह सुटला नाहीं.
बाळाजीनें मुंजी थांबविल्या नाहींत, तेव्हां ब्राह्मणांनी हातघाईवर येऊन
दंगा करण्यास सुरवात केली. रघुनाथपंत अमात्याने घटिका विच्छिन्न
करून घंगाळ उडवून टाकलें. मोरोपंत पेशवे व बाळंभट चितळे यांस
बाळाजीनें सांगितलें कीं " तुम्ही महाराजांच्या पट्टाभिषेकाचा विषय
चित्तांत धरून विक्षेप करीत आहांत त्याअर्थी मी अशी प्रतिज्ञा
करितों को, प्रथमतः महाराजास राज्याभिषेक करवून नंतर माझ्या
मुलांच्या मुंजी करीन. " मत्सरानें फुरफुरलल्या या दांभिक धर्मा-
भिमानी ब्राह्मणांची समजूत घालण्याचा आटोकाट यत्न करण्यांत आला,
परंतु मत्सर दुराग्रह न सुटे तेव्हां त्या सालीं मुंजी तहकूब करून नंतर हे सर्व वृत्त
महाराजांस श्रुत केलें. व परस्परें ऐकण्यांतही सरकारांत आलें. तदनंतर एक-
दोन रोजी महाराजांनीं चिटणीस यांस एकांतीं बोलावून आणून या गोष्टीची चर्चा
भवति न भवति फार जाहली क्षत्रिय आहेत किंवा नाहींत हें दाख-

वावयाचे परंतु यास अनुकूल ब्राह्मण मंडळी होणार नाहीं.
याकरितां तुम्हांसही
परंतु तुम्हीं आपलें
अडवून बोलतात. वरकड त्यांचें कांहीं चालतच नाहीं.
प्रकरण क्षेत्रांस पाठवून संमतें आणवावीं आणि कार्यसिद्धी करावी.

याप्रमाणें मुंजी तहकूब करून घडलेलें वर्तमान बाळाजीनें महाराजांस
कळविलें. बाळाजीची प्रतिज्ञा ऐकून महाराजांस मोठा संतोष वाटला.
त्यांनीं लागेल ती मदत देण्याचें बाळाजीला आश्वासन दिले. त्यानंतर
महाराजांबरोबर गुप्त मसलत करून बाळाजीनें काशीहून गागाभट्ट नामें
महापंडित आणून त्याच्या हस्ते राज्याभिषेक करवावा असें ठरविलें. तेव्हां
महाराजांच्या अनुमतीनें गागाभट्टास आणण्याकरितां त्यानें केशवभट्ट
पंडित, भालचंद्रभट्ट पुरोहित व सोमनाथभट्ट कात्रे या त्रिवर्गीस गागा
भट्टजीस आणण्यास काशीस रवाना केलें. या त्रिवर्ग भट्टजीनीं काशीस
जाऊन महाराजांच्या पैशाचा मात्र फन्ना उडवला व गेले तसे हात
हालवीत परत आले. येतांना 'शिवाजी महाराजांस छत्र सिंहासनाचा<noinclude></noinclude>
fllnqm1vpm4podmb9d08fgobhprsajf
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७१
104
111727
235894
2026-08-21T11:46:18Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235894
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १५ )

अधिकार नाहीं ' अशा अर्थाचें गागाभट्टाचे पत्र मात्र घेऊन आले.
त्यावरून महाराजांसहि वाईट वाटले. आपला सर्व व्यूहच ढांसळून
पडतो की काय असें त्यांना वाटलें. तेव्हां बाळाजीनें महाराजांस
समजाविलें कीं, या पंडित व सर्वज्ञ ह्मणविणाऱ्या ब्राह्मणांस आपल्या
पूर्वजांविषयीं असावी तितकी माहिती नसल्यामुळे त्यांना आपले प्रकरण
गागाभट्टास नीट समजावितां आलें नाहीं. तेव्हां पुन्हां दुसरा कोणी
जाणता माणूस पाठविला पाहिजे. आपल्या पदरच्या ब्राह्मणमंडळीनें
जाणूनबुजून हा खोडसाळ प्रकार केला असला पाहिजे हें महाराजास
न समजण्याइतके ते दुधखुळे खास नव्हते. म्हणून त्यांनीं निळो येसाजी
प्रभू पारसनीस यांस पाठविण्याविषयीं सांगितलें. त्यावरून निळो
येसाजी हे काशीस गेले, त्यांनी गागाभटजींस सर्व मजकूर यथातथ्य
समजावून सांगितला व शिवाजी राजे शुद्ध क्षत्रिय आहेत अशी त्यांची
खात्री करून दिली. शिवाजी महाराजांची वंशावळ उदेपुराहून आणून,
तेथील राजघराण्यांतीलच हे एक राजपुरुष आहेत असा पुरावा बाळाजीनें
आधींच आणवून निळो येसाजीजवळ दिला होता. त्यावरून खात्री होऊन
गागाभट्टजी रायगडास आले.
रायगडास आल्यावर गागाभट्टांनीं आपल्या पूर्ण खात्रीकरितां पुन्हां
चौकशी करून अनेक ग्रंथ पाहून शेवट असा निर्णय केला कीं 'शिवाजी
महाराज हे शूद्र; त्यांना राज्यसिंहासनाचा अधिकार नाहीं. '
येथें हि
गागाभट्टाच्या कानांचा चांवा घेण्यास मत्सरी चिलटांनीं संधि साधली
नसेल असें म्हणवत नाहीं. आमच्याजवळ असलेल्या एका अप्रकाशित
बखरींत म्हटले आहे :-
श्रीमनंदनवन गौरी त्रिकंटक वाराणसी क्षेत्रस्थ गागाभट्ट भटोजी दीक्षित
- वंशान्वय संजात श्रीमन्ना सिहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमछीवाजी महाराज
यांस पट्टाभिषेक करण्याकरितां श्री महाक्षेत्रीहून आणिले. तें समय चांद्रसेनीय प्रभु
कायस्थ यांचा सिंहासनाधिकार हे क्षत्रिय आसा निर्णय करून शूदास अधिकार
नाहीं असें स्पष्ट नूतन गागाभट्टी म्हणोन ग्रंथ संपूर्ण शास्त्र पौराणांतर इतिहास वाक्यें
आनकूल घेऊन केला. ते समयीं मोरोपंत पेशवे व निलो सोनदेव मजमदार याणीं<noinclude></noinclude>
0tuy2xemgpga6p9hg5186664wo08jrw
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७२
104
111728
235895
2026-08-21T11:46:32Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235895
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १६ )
गागाभट्टास येकांतीं आपले घरीं नेऊन नानाप्रकारें समजाविलें कीं तुम्ही प्रभूंचा
अधिकार राज्याचा स्थापित केला. शूद्राधिकार नाहीं. तेव्हां यांचे कुळाचे ठायीं
कोणी उत्पन्न होईल तो आमचा अधिकारी असाच निर्णय झाला. म्हणोन
आपले स्वसामर्थ्यं राज्य करतील. सिंहासनाधीश्वर होतील. परंतु महाराजांनीं श्रम
करून तुम्हांस आणले यांचा अधिकार तरी नाहीं. उगाच ईश्वर वरप्रसादेकरून
भाग्यवान होऊन ऐश्वर्यवान जाल्यामुळे तुम्ही एखादा विचार काढून यास राज्या-
भिनिवेश कराल हाच विचार यांतील किंवा दुसरा प्रकार तो सांगावा.
शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्याकरितां भीम प्रयत्न करून
बाळाजीनें गागाभट्टास रायगडास आणले तेव्हांच त्याचे प्रतिपक्षी चीत
होऊन गेले. पुढे जेव्हां गागाभट्टानें राज्याभिषेकाचा अधिकार बाळाजी -
सच आहे, शिवाजीस किंवा इतर दुसऱ्या कोणासही नाहीं असें सांगितलें
तेव्हां तर या ब्राह्मण मंडळीचा धीर अगदींच सुटला व त्यांनीं आपल्या
पगड्या लागल्याच फिरविल्या. बाळाजीला राज्याभिषेक होण्यापेक्षां तो
शूद्र ( ? ) शिवाजीस झाला तरी पत्करला. असा विचार करून मोरो-
पंतादि मंडळीनें गागाभट्टाजवळ तसें बोलणें चालविलें.
त्यावरून गागाभटजीनीं सांगितले कीं हे चांद्रसेनीय क्षत्रिय यांचाच अधिकार
सिंहासनाचा. याणीं हजारो रुपये खर्च करून आपला स्वधर्म निर्णय करण्याकरितां
केले आणि त्यांचे पूर्वापार जाणून आम्हीं मान्य करून क्षेत्रीं ग्रंथ करून आणिला.
व त्यांनीं आम्हांस अगत्यांनी आणिलें. त्यापेक्षां आधर्म करणें, ज्ञातीस दोष ठेवणें
हे महनिय कर्म. आमचे हस्तीं कसें होतें. अशी गोष्ट तुम्हीही बोलों नये.
मशारनिल्हे उपद्व्यापी मंडळींची गागाभटजीनीं याप्रमाणें संभावना
करतांच शेवटचा उपाय म्हणून खुद्द शिवाजी महाराजांचे कान भारतां
आले तर पहावेत म्हणून ते त्यांची भेट घेण्यास गेले, आणि—
मोरोपंतानीं व निळोपंतानीं सविस्तर मजकूर माहाराजास समजाविला. आणि
तुम्ही शुद्र तुमचा सिंव्हासनस्थ होण्याचा अधिकार नाहीं असें स्पष्ट भटजीनों
आम्हाजवळ सांगितलें. तेव्हां आम्हीं त्यास विचारिलें कीं महाराजानों एवढा
साहस करून आपल्यास आणिलें कारण मिळोन संपूर्ण पृथ्वींतील सार्वभौम पदवी
आपणास प्राप्त असावी, करावी. त्याप्रमाणे ईश्वर अनुकूल होऊन येश येत आहे-<noinclude></noinclude>
4gq1yaurvrt9tiel8ndke8pi5r2j061
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७३
104
111729
235896
2026-08-21T11:46:46Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235896
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १७ )
तेव्हां गागा भटजीनीं तरी आपला अधिकार नाहीं असा निर्णय केला. यावरून
बाळाजी बावानीं आपले साधनाकरितां आपल्यास भरीस घालोन आपला मतलब
साधून आपली शुद्धता केली.
दुसरी एक आम्हांजवळील अप्रकाशित बखर म्हणते :---
गागाभट्टी केली तेसमयीं कायस्थप्रभु क्षेत्रीय राज्याधिकारी ठरविले. त्रय-
कर्माधिकारी. ते रघुनाथपंत अमात्य याणी पाहून राजास सांगितले गागाभट्टास
आणोन तुम्ही आपले घर आपले हातून बुडवून प्रभुचे घरीं राज्य घातले. आज
तुम्हीं धणी आहांत परंतु शुद्र. तुमचा अधिकार नाहीं. असा निर्णय साफ
लिहिला.
याप्रमाणें मोरोपंत पेशवे, निळो सोनदेव व रघुनाथपंत अमात्य हे तिघे
राज्याभिषेकाच्या कट्टे विरुद्ध असलेले ब्राह्मण आतां राज्याभिषेकाला अनु-
कूळ असा वेदांत सांगूं लागले. त्यांच्या एकांताचा महाराजांच्या मनावर
परिणामहि झाला.
बखर पुढे म्हणते:-
आपल्या प्रयत्नाची निर्फळता दिसोन आली. त्यावरून त्यांची बोलणी
यथार्थ अंतःकर्णांस वाटून गागाभटजीस माहाराजांनीं एकांतीं नेऊन हे उभयता
कारभारी घेऊन ग्रंथ काढवून कल्पना घेऊन नानाप्रकारें विचारिलें. परंतु क्षत्रिय
वर्ण शुद्ध यांस दोष आमचे हस्ते लाववत नाहीं असें गागाभटजीनीं साफ उत्तर
केलें. तेव्हां बरें बोलूं म्हणून ती वेळ कचेरी मोडून भालचंद्र भट पुरोहित यास
महाराजांनीं सांगून धर्माधिकार तुम्हांस वंशपरंपरेनी देऊ. परंतु आमचा अधि-
कार राज्याचा ग्रंथ संमते निर्णययुक्त करऊन प्रभूस दोष ठेऊन अधिकारापासोन
च्युत करावे असें सांगितल्यानंतर भालचंद्र भटजीनीं गागाभटजीस कांहीं लोभप्रद
भाषण करून दोष लावितों असें बोलोन आभव घेऊन महाराजांस श्रुत केलें. नंतर
चांद्रसेनीय यांस दोष ठेवून महाराजास अधिकारपरत्वें वाक्यें लाविलीं.
वास्तवीक शिवाजी महाराजांना विधियुक्त राज्याभिषेक व्हावा ही
मूळ प्रतिज्ञा बाळाजी आवजीची. अर्थात् शास्त्रसंमतानें त्याच्यावर जरी
गागाभट्टी हा ग्रंथ निःपक्षपातानें लिहिला नाहीं असा गागाभट्टावर जो आरोप आहे
तो खरा आहे याचें हें बलवत्तर प्रमाण आहे.
2
1<noinclude></noinclude>
dpg090lxk7jkkr96inj3slp73s7kajf
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७४
104
111730
235897
2026-08-21T11:48:48Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235897
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>९
( १८ )
गागाभट्टानें राज्याभिषेकाची शाब्दिक बळजबरी करण्याचा घाट घातला
होता, तरी बाळाजीनें त्याला मुळींच संमति दिली नाहीं. परंतु नेहमीं
द्राविडी प्राणायामाच्या कसबांत मुरलेल्या त्याच्या ब्राह्मण प्रतिस्पर्ध्याना
आतां मात्र बाळप्रभूला राज्याभिषेक खास होणार ही भिती पडून त्यांनी
शिवाजी महाराजांना आपल्या उलट्या कारस्थानी मंत्रांनी भारण्याचा व्यर्थ
यत्र केला. असो ! कोणत्या कां मार्गानें होईना, अखेर बाळाजीचे
प्रतिस्पर्धी बाळाजीच्याच प्रतिज्ञेचा पुरस्कार करण्यास तयार झाले.
याप्रमाणें व्यवस्था होऊन राज्याभिषेकाची तयारी झाली. तरीसुद्धां
गागाभट्टाचें मन तयार होईना ! पण-
शिवाजीचें भरगच्ची स्वागत अनुभवून गागाभट्ट अगदीं खुष झाले, व
त्यांनींच कल्पना काढिली कीं, मुसलमान पादशहा सिंहासनावर बसून छत्र,
अवदागीर इत्यादि राजचिन्हें जर धारण करितात, तर मग इतका पराक्रम करून
ज्याने एवढे राज्य स्थापिलें, त्या शिवाजीनें राजचिन्हें धारण करूं नयेत हैं कांहीं
योग्य नव्हे.*
या ( महाविद्वान् पंडितास राज्याभिषेक ) समारंभाकरितां मुद्दाम
आणविलें होतें. परंतु राज्याभिषेकाच्या वेळेस लागणारे मंत्र गागाभट्ट म्हणेना.
सबब राजकीय धोरण त्याजपुढे मांडावे लागलें.
वरील हकिकतीप्रमाणें एकंदर प्रकार होऊन नंतर गागाभट्टानें शिवा-
जीस राज्याभिषेक करविला. राज्याभिषेक समारंभ समाप्त होतांच बाळाजीनें
लागलेंच आवजी बावा यांच्या व्रतबंधाचा समारंभ मोठा करविला. सर्व शिष्ट व
महाराज समारंभांत येऊन सांग केला. ग्रामण्यें बहुत वाढून उपहास कटकट
कांहीँ जाली नाहीं. थोड्यांतच परिमार्जन होऊन मत्सर पाहणार त्यांची निशा
जाहली.
गागाभट्टीमध्यें गागाभट्टानें आपल्या जातीला दूषण लागेल असा
मजकूर मागाहून घातला है वर्तमान बाळाजीस समजलें :-

'मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष, पृ. १६४.
t
+ - कित्ता-
पृ १६३.<noinclude></noinclude>
1q21phppc5zlgy8i99g3p0cskltbhai
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७५
104
111731
235898
2026-08-21T11:49:02Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235898
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( १९ )
Q
ते समय बाळाजी बावानी गागाभटजीस विचारलें. त्याणीं उत्तर केलें
कीं बाबा, हा समय असाच आहे. समजेल त्यास या ग्रंथेकरून तुम्ही अधिकारी
योग्य आहांत. न समजल्यास नीटच आहे. लिहिलें तें प्रमाण बोलोन व्यंगीत
गुह्य होती ती समजाविली.
याप्रमाणें हें ग्रामण्य निकालांत निघाले. यावेळचें एक पत्र उपलब्ध
झालें आहे तें असें :-
राजमान्य राजश्री समस्त चांद्रसेनीय प्रभु लोक वर्णोचित स्वधर्मपरायण यांस:-
प्रति रघुनाथ पंडित 'पंडितराव ' कृतानेक आशिर्वाद. तुम्हां लोकांचे घरीं पंच-
महायज्ञ व श्रावणी व मुंजी व इष्ट पूर्तादिक सकल कर्मों यथोचित मार्गे करण्यास
ब्राह्मणांचे तर्फे खळखळ होती यास्तव समस्त पंडित मंडळी श्रीमत् महाराज
राजश्री राजे यानी मेळवून 'ज्याचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा. त्यांत कोणी
बखेडा करूं नये. धर्मस्थापनेकरितां आमचें साहस त्यांत अधर्माचा दोष
न यावा' अशी आज्ञा जाली. त्यावरून यथाशास्त्रार्थ ग्रंथावलोकन करून निर्णय
चांद्रसेनी शुद्ध क्षत्रियवर्ण सिद्ध जाल्यानंतर श्रीक्षेत्रों सरकारांतून गोविंदभट्ट खेडकर
यांस राजश्री बाळाजी आवजी चिटनवीस यांनी विनंती महाराजांस केल्यावरून
पाठविलें. तेथे श्री मच्छंकराचार्यान्वय सद्गुरु अनंतदेव स्वामी व गागाभट्ट आदि
क्षेत्रस्थ यांनीं निर्णय करून शास्त्रमार्गे तुमचा धर्म यथोचित संमती लेहून पाठ-
विली. चांद्रसेनी दालभ्यगोत्री प्रसिद्ध राहतील ते क्षत्रियवर्ण कलयुगीं आहेत. त्या-
वरून कोंकण प्रांतों महालोंमहालीं कळविलें आहे. तीं पत्रे कोणों न दाखवितां
द्वेष बुद्धीनों कर्म करण्याचालविण्यास बखेडा करितील ते देवाब्राह्मणांचे द्रोही व
राजदंडास अधिकारी होतील व ज्ञातीचे अपराधी समजोन यथा शास्त्र वेदोक्त
कर्म करावें. मिती शके १५९१ सौम्यनाम संवत्सरे, मार्गशीर्ष शु ॥ ११ सु.
सितेन सबेन आलफ बहुत काय लिहिणें हे आशिर्वाद.
याच ग्रामण्याबद्दल आणखी कांहीं संशोधकांचे उतारे उपलब्ध आहेत,
ते खालीं नमूद करून हें चतुर्थ ग्रामण्य येथें पुरे करूं.
(१) " तिसरें ग्रामण्य रायगडीं बाळाजी आवजी चिटणीस यांचे पुत्राचे मुंजी समयीं रघु-
-नाथ पंत अमात्यानें केलें. घटिका विच्छिन्न करून आरंभ केला तेसमयीं शिवाजी महा-<noinclude></noinclude>
lqdhflo3kmlygp6gxnvsym978w1qp9u
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७६
104
111732
235899
2026-08-21T11:49:15Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235899
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २० )
राजानीं ब्राह्मण मिळवून शास्त्रार्थ करून पंडितराव यांचीं पत्रे देऊन ग्रामण्याचें निराकरण
केलें. शके १५९१ (इ. स. १६६९ ) " प्रभु कुलदीपिका पृ. १५०.
( २ ) " तिसरें ग्रामण्य चिटणीसाचें अवजी बल्लाळ याचे मुंजी समयीं रघुनाथपंतीं केलें.
तें निराकर्ण गणेश जोशी दिक्षित शास्त्री टकले यांनी केले. शके १५९१.

रा. राजवाडे म. इ. सा. खंड ६ लेखांक ४४४ पृ. ५२३.
(३) “ बाळाजी आवजीचे चिरंजिवाचा व्रतबंध, शके १५९५ साधारण नाम संवत्सरे सन
इहिदे सबैन अलफ.
ब्राह्मण यांनीं ग्रामण्य घंगाळ लवंडिलें. मंत्रानुप्रचित मुलाची पाहून रजा दिली. सबब
शुद्रास राज्याभिषेक करणें अभिमान धरून संमत काशीचे आणले. नंतर गागाभट आले.
न्यास समत न देत ब्राह्मण. तेव्हां चिटणीसासी तंटा केला. हा कलुष मनांत आणून
कारभारी अनकूल जाले. मंत्रोपदेश करविला. नेम पूर्वी ठरला होता सा।। चांद्रसेनीस
न करणें. गागाभटजी लि।। त्यास आणावयास गोविंदभट खेडकर पाठविले. निळो सोनदेव
याची मुभूमी काढली. पुढे रघुनाथपंत चंदीहून आले. त्यांनी रदबदली करून वस्त्रें मुजु-
मीची दिली. शके १५९३ विरोधकृत संवत्सर, इसने सबैन अलफ.
रा. राजवाडेकृत म. इ. साधनें, खंड ६ लेखांक ४५९, पृ. ५४६ ४८.
ग्रामण्य पांचवें.
कल्याणप्रांतीचें ग्रामण्य ( शके १५९३ इ. स. १६७१).
हैं ग्रामण्यहि श्रीशिवछत्रपत्मेच्या कारकीर्दीतच झालें. परंतु या ग्राम-
ण्याची सविस्तर हकिकत उपलब्ध व्हावयाची आहे. रा. रामराव नारायण
प्रधान म्हणतात:-
" ( हैं ) ग्रामण्य कल्याणप्रांतीं झालें. ते समयीं रघुनाथ पंडित यांची पत्र
कोकणप्रांतों येऊन निराकरण केलें. शके १५९३. " प्रभुकुलदीपिका, ट १५३.
रा. राजवाडे म. इ. साधनें, खंड ६, लेखांक ४४४ येथें
म्हणतात :-
" ( हैं ) ग्रामण्य कल्याणप्रांतीं जालें. त्याजला रघुनाथ पंडीत अमात्याची पत्र
नेऊन निराकरण केलें. शके १५९७”<noinclude></noinclude>
fiu6aq2eiyu7b0u2kgaw0frullaq8vj
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७७
104
111733
235900
2026-08-21T11:49:29Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235900
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २१ )
या ग्रामण्यासंबंधानें आम्हांस एक पत्र उपलब्ध झालें आहे तें येथें देतों:-
" महाराज राजश्री शिवराज वर्णाग्रामोची व यथा शास्त्रोक्त स्वधर्मपरायण
राजमान्य राजश्री समस्त प्रभु लोकासी प्रती पंडित रघुनाथ कृतानेक अशिरवाद
तुम्हां लोकाचे घरी पंचमहायज्ञ व श्रावणी इष्टपुर्तादिक सकल कर्मे यथो-
चित मार्गे करावयाची. तुमचे तर्फेनें व ब्राह्मणाचे तर्फेनें खळखळ पडते. यास्तव
कोणाचे कर्म उजागर मार्गे सांग होत नाहीं. याबद्दल रा० बाळाजी प्रभु याणी
श्री यासी विनंती करून श्री वाराणसीस वेदमूर्ति गोविंदभट खेडकर हे पाठवून
सद्गुरु अनंतदेवस्वामी व गागाभट भटवंशी याजकडोन सकल शास्त्रार्थ निर्णय
मार्गे तुमचा धर्म चाले असा कायस्थप्रदीप म्हणवून उत्तम ग्रंथ आणिला.
तो देशामध्ये सकल ब्राह्मण लोकाशी संमत असे म्हणवून बाळाजी आवजी आदि-
करून येणेंप्रमाणें सकळ धर्मकृत्य व्यवहार चालत आहे त्यावरून आपलीं कमें
करीत जाणे म्हणजे सर्वासंमते असे. जो कोणी हा शास्त्रार्थ टाकून अन्यथा
पाखांड करतील ते देवाचे व ब्राह्मणाचे व राज्याचे व जातीचे अपराधी असे दंड,
पावेल यास्तव सदहू शास्त्रोक्ताप्रमाणे वर्तत जावे. कळावे शके १५९४
पुरधावीनाम संवत्सरे, भाद्रपद शुद्ध ६ रविवार सु॥ सन सला सबैन आलफ.

चां. का. प्र. इ. साधनें यांत प्रसिद्ध झालेली बखर, ग्रामण्याची हकिकत,
प्रभुरत्नमाला, एथ्नॉग्राफिकल नोटस इत्यादि पुस्तकांत या ग्रामण्याचा
उल्लेख नाहीं. म. इ. साधनें खंड ६ यांत लेखांक ४५९ मध्ये रा. राजवाडे
यानी जी यादी दिली आहे, तींतहि याचा उल्लेख नाहीं.
छत्रपती शिवाजीच्या कारकीर्दीत ग्रामण्याची सुरवात शके १५८४
इ. स. १६६२ साली झाली असा आमच्या जवळील एका बखरींत उल्लेख
आहे. चौथ्या ग्रामण्याच्या शेवटीं रघुनाथ पंडिताचें जें पत्र दिलें आहे
तें शके १५९१ (इ. स. १६६९ ) चें आहे. छत्रपती शिवाजीस राज्या-
भिषेक (इ. स. १६७४ ) शके १५९६ आनंदनाम संवत्सरे ज्येष्ठ
शु॥ १३ स झाला. प्रस्तुतच्या पांचव्या ग्रामण्याचें साल रा. रा. ना.
प्रधान, शके १५९३ ( सन १६७१) हैं देतात, व रा. राजवाडे यांच्या
पहिल्या यादीत शके १५९७ ( इ. स. १६७५ ) हें साल दिले आहे. वर
दिलेले पत्र शके १५९४ (इ. स. १६७२ ) चे आहे. या दोन्ही ग्राम-<noinclude></noinclude>
st3t6l3afsvbom5nlgm3usncf0ayren
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७८
104
111734
235901
2026-08-21T11:49:46Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235901
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २२ )
ण्याच्या सनांचा व हकिकतीचा विचार करितां आम्हांस असें वाटतें कीं,
हें सर्व ग्रामण्य एकच असून शके १५८४ पासून शके १५९७ पर्यंत चाललें
होतें. छत्रपती राज्याभिषेक केल्यानंतर गागाभटजीनें बाळाजीच्या
मुलांच्या मुंजी लावल्या त्या शके १५९६ मध्येच. यावरूनहि हीच गोष्ट
सिद्ध होते. रघुनाथपंत अमात्याचीं शके १५९१ व शके १५९४ चीं
दोन्ही पत्रे शिवाजीच्या आज्ञेवरून लिहिलेलीं आहेत हैं उघडच आहे.
त्यावरून असें अनुमान होतें कीं शिवाजी मधूनमधून ब्राह्मणांस दाबांत
ठेवीत होता व " खावंद सूज्ञ जबरदस्त " यामुळेच या ग्रामण्यांत
ब्राह्मणांकडून अत्याचार घडून प्रभु लोकांस विशेष त्रास झाला नाहीं.
66
ग्रामण्य सहावें.
यमाजी शिवदेव याचें ग्रामण्य. शके १६६९ इ. स. १७४७.
शाहू महाराज यांचे कारकीर्दीत यमाजी शिवदेव मुतालिक
निसबत प्रतिनिधि यांणीं ग्रामण्य केलें. त्यांतील मजकुराचा
तपशील:-
छत्रपती शाहु महाराजांच्या कारकिर्दीच्या शेवटीं शेवटी त्यांच्या प्रकृ-
तीस स्वास्थ्य नव्हतें. त्यावेळीं गोविंद खंडेराव चिटणीस व जिवाजी
खंडेराव चिटणीस हे राज्याचा कारभार करीत असल्यामुळे सर्व राज्यसूत्रे
त्यांच्याच हातीं होतीं.
जीवाजी खंडेराव चिटणीस व गोविंद खंडेराव चांद्रसेनीय कायस्थ प्रभु यांज-
वर महाराजांचा पूर्ण लोभ व यांचे निष्ठेनें वागणं म्हणून यांजवर फार विश्वास.
त्यांत प्रतिनिधि हुजूर खासगी वगैरे कारभार पाहत होते. त्यांजकडून यमाजीपंत
सर्व काम चालवीत होते. परंतु मोठे राज्यकारणाचे वगैरे महाल सुभे या
कामांत पंत प्रधान यांची व यमाजीपंत व जगजीवन परशराम ऊर्फ दादोबा
प्रतिनिधि यांची चुरस वागूं लागली. त्यांत गोविंदराव व बाळाजीपंत नाना
प्रधान पंत याचा अति ऋणानुबंध व नाना पेशवे यांचे बोलणें व गोविंदराव यांचे<noinclude></noinclude>
ggadvbwl9hnqjm2lb8jlldgch88353a
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/७९
104
111735
235902
2026-08-21T11:50:01Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235902
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २३ )
बेत सरकारांत चालत असत. महादोबा बाबा पुरंधरे मुतालिक निसबत पंतप्रधान
हे हुजुरीं हरकामांत विश्वास खावंदासीं वागत असोन यमाजीपंताचे हरवक्त हरएक
कामांत मोडते येऊन परस्परें कोणाचे करणें कोणाचे मनांत येऊ देत नसत.
गोविंदराव यांची व महादोबा बाबा यांची जुगल एकदीली वागून ते यमाजीपंत
यांच्या वागणुकीचा कारभार आग्रही असे याजमुळे तो चालू न देत. तेव्हां
यमाजीपंत अतिद्वेष करण्यास प्रवर्तला. परंतु कारभारासंबंधीं महाराजाचे कृपेच्या
जोरामुळे न चाले. तेव्हां ग्रामण्याचा विचार ब्राह्मणांवर येऊन कांहीं ब्राह्मण-
समुदाय जमा करून करावें परंतु तें न चाले. तेव्हां माहुली वगैरे ठिकाणों कर्मास
अटकाव करावा ही योजना केली. त्यांत यमाजीपंत जातीनें पढिक दोन शास्त्र
अध्ययन असे होते. तेव्हां प्रभुज्ञातीवर दोष अनेक तऱ्हेचे विद्यावलें आणून ग्रंथ
एक केला. परंतु न चाले. माहुली येथें कर्मास बखेडा केला.
याबद्दल बखरींत म्हटले आहे की :-
शाहू महाराज राज्याधिकारी जाहले. त्यांचं कारकीर्दीत येथास्थित चालत
असतां प्रतिनिधीचे कारभारी यमाजीपंत याणीं ग्रामण्य केलें. खोट्या नूतन
कवितेच्या फकीका ग्रंथांत अनन्वित लाऊन कटकटी करूं लागले. तेव्हां शहु-
राजा याणें कै० श्रीमंत नानासाहेब यांस सातान्यास बोलावून मनास आणावयास
सांगितले.
तेव्हां बाळाजी बाजीरावानी शाहू महाराजांस पत्र पाठविलें :-
श्रीमंत क्षत्रियकुलावतंस महाराज राजश्री छत्रपति स्वामीचे सेवेसीं,
विनंति सेवक बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक विज्ञापना सेवकाचें वर्तमान
तारीख १९ सावान पर्यंत महाराजाचे कृपावलोकॅकरून यथास्थित असे. विनंति
प्रस्तुत सातारे यासी ब्राह्मणांनीं गलबला केला आहे. त्यास काशीतील उभय-
तटांचे ब्राह्मण कलह करीत आले आहेत. त्याचें वर्तमान महाराजांनी मनास
आणून समजावीस करून लावून द्यावे. प्रभूचें सुदामतप्रमाणे चालत आले आहे.
त्याप्रमाणें चालवावें. त्यास अडथळा होऊं नये. [ स्वदस्तूर ] पूर्वापार चालत
आले ते चालवावे, नवीन कज्या योग्य नाहीं. ब्राह्मणाचा निर्गमही स्पष्ट आज्ञा
करून करणार महाराज समर्थ आहेत सेवेसीं श्रुत होय हे विज्ञापना.<noinclude></noinclude>
sclu9ktwroq4t4chra7y8hf9ujpypih
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८०
104
111736
235903
2026-08-21T11:50:22Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235903
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २४ )
नानासाहेब पेशव्यांचें याप्रमाणें पत्र येतांच रघुनाथ पंडित व शाहु
महाराज यांनीं यमाजीपंताची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला.
परंतु " यमाजीपंती " नांवाचा विश्वामित्री मजकुराचा एक ग्रंथ करून
गागाभट्टावर चढाई करण्याच्या कोत्या आढ्यतेनें फुगून गेलेल्या यमाजी-
पंतावर त्याचा कांहींएक परिणाम झाला नाहीं.
महाराजांनीं क्षेत्रास पत्र दिलें. तें वर आपले हातच्या अक्षरांच्या ओळी
लिहून दिलें. व पंडितराव रघुनाथ पंडित यांचे पत्र दिलें. आणि पूर्वीपासून वेदोक्त
कर्मे चालत होतीं त्याप्रमाणे चालविलीं तीं पत्र.
(१) वेदशास्त्रसंपन्न समस्त ब्राह्मण क्षेत्र खंडे व क्षेत्र महाऊली उभय
कृष्णातीर यांसीं आज्ञा केली ऐशी जे, प्रभु हे पुरातन प्रांतीचे आणि तुम्हीहि
याच प्रांतीचे प्रभू यांची क्रियाकर्मातरं व शुभकर्मे व उत्तरकार्ये, जें पुरातन
चालत आलें तें तुम्हीं जाणतच आहां ज्याप्रमाणें पूर्वीपासून चालवीत आलां
आहां. त्यास प्रस्तुत याच्या क्रियाकर्मातराचा प्रसंग पडला आहे. त्यास
पुरातन विजापूरचे वक्तों व कैलासवासी शिवाजीमहाराज याचे वेळेस, व कैलास-
वासी संभाजी महाराजांचे वेळेस व कैलासवासी राजाराम महाराज साहेब व
मातोश्री ताराऊ साहेब यांचे वेळेस व हल्लीचे कारकीर्दीत चाल चालत आली
त्याप्रमाणे उत्तरकार्ये व सर्व कर्मों चालवीत जाणे जुनें न मोडणे. नवें न करणें.
पुरातन चालोप्रमाणें चालवणे. [ खुद्द महाराजाचे दस्तूर : - ] पुरातन चालवीत
आलां त्याप्रमाणे चालवणे. नवें न करणें. जुन न मोडणं लिहिल्याप्रमाण
वर्तणं बहुत काय लिहिणं हे विनंति मि॥ कार्तिक शु० १५, शके १६७२.
तसेच महाराजांच्या आज्ञेवरून रघुनाथ पंडितानीहि एक आज्ञापत्र
काढिलें :-
( २ ) वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री उभयक्षेत्र माहुली व परशुराम,
स्वामी गोसावी यांसों, प्रति रघुनाथ भट पंडितराव नमस्कार विनंति उपरि,
प्रभूंच्या क्रियेचा गुंता पडला यामुळे महाराज राजश्री स्वामींनीं आज्ञा केली जे,
पूर्ववत् कैलासवासी शिवाजी महाराज यांचे कारकिदांपासून क्रिया चालत असेल<noinclude></noinclude>
55nhef8yy5rbm5y9sc9yq7thiugnjnh
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८१
104
111737
235904
2026-08-21T11:50:42Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235904
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २५ )
त्याप्रमाणें चालवावें म्हणोन महाराजांनी आज्ञा केली त्याजवरून हें पत्र तुम्हांस
पाठविलें आहे. तरी सुदामतप्रमाणे मनास आणोन क्रिया चालती करणें. बहुत
काय लिहिणें हे विनंति.
ब
890/9860
याप्रमाणे शाहु महाराजांनी जरी व्यवस्था केली तरी त्याचा कांहीं-
एक उपयोग झाला नाहीं. प्रतिनिधी व चिटणीस यांच्यांत वैमनस्य
पाडावें हा जो यमाजीपंताचा उद्देश तो या ग्रामण्याच्या योगानें उत्तम
तडीस गेला. राज्यकारभारांत दोन तट झाले. चिटणीसांच्या पक्षाचा
पूर्ण पाडाव करण्यासाठीं यमाजीपंतानें कंबर बांधली. इतक्यांत बाबुराव
खंडेराव चिटणीस यांनी प्रयागक्षेत्रीं जाऊन तेथें अतिरुद्र होम करविला.
मग काय विचारतां ? आगीत तेलच पडलें. ग्रामण्याचे स्वरूप उग्रतम
झाले व ब्राह्मणांनीं जारीने बखेडा सुरू केला.
तेव्हां नारायण दीक्षित यांनीं कांहीं ब्राह्मण तेथील चित्पावन मिळवून, यमाजी
पंताचे लिहिणें गेल्यावरून बखेडा करणें मांडिला .
नंतर आज्ञा महाराजांनी स्पष्ट केली कीं, लबाड कारभार आहे, परत जावें.
तेव्हां परत लावून दिल्हे. कांहीं चालत नाही. कमे वगैरे पूर्ववत यथास्थित
चालली. यमाजी पंताचें चाललें नाहीं, तेव्हां अतिशेष दीर्घद्वेष वाढला. पुढे
कांहीं दिवशीं महाराजांस व्यथा झाली. फार हैराण त्यांत सौभाग्यवती राणा-
साहेब दादोबा प्रतिनिधि व आपण होऊन वाड्यांत बंदोबस्त करून पेशवे व
चिटणीस यांनी वाड्यांत जाऊं नये असे केले. आपल्या चौक्या बसविल्या.
यहाँ आपल्या चौक्या बसवून बळेंच जावें असें होत आलें. तों महाराजाचा
काळ जाला. महाराजांनी बंदोबस्त करावा. दत्तक घ्यावा प्रतिनिधिचें पारपत्य
करावें. फारच यानें बखेडा केला. उद्दाम झाले. त्यानंतर काळ जाला ;
तेच दिवशी दादोबा प्रतिनिधीस धरले व यमाजीपंत पळाले. ते कुणबीणीचे
लुगडें नेसून कणगीत लपले. तेथें ठिकाण लावून तसेच बांधून आणिले. उभ-
यतांस बेड्या घालून कैद केलें. आणि बंदोबस्त केला. ऐसी ग्रामण्याची समाप्ती
झाली. पुढे कांहीं दिवसांनी सोडल्यावर यमाजीपंतांनीं स्वदस्तूरचें गोविंदराव
यांस निखालसतेनें पत्र लिहिलें तें यमाजीपंताचं पत्र – राजश्रिया विराजित
-<noinclude></noinclude>
if0u8xax3rfgbdw4v7bjzsqcgnee3oi
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८२
104
111738
235905
2026-08-21T11:50:59Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235905
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २६ )
राजमान्य राजश्री गोविंदराव, गोसावी यांशीं, स्नेहपूर्वक यमाजी शिवदेव विनंती
येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन केलें पाहिजे. विशेष काली छ २५ साबानीं
श्रीमंत, राजश्री प्रतिनिधि यांचं व श्रीमंत मातुश्रीचे दर्शन घेऊन वाड्यांत येऊन
राहिले. आम्हीही समागमें होतों. आम्हांस आपले वाड्यांत राहणें म्हणोन आज्ञा
केली त्याजवरून वाड्यांत येऊन राहिलो. आपल्यास वर्तमान कळावें म्हणोन
लिहिलें आहे. तुम्हीं पत्र पाठविलें तें पावोन परम समाधान झालें. तें पत्र लिहितां
येत नाहीं. भेट व्हावी हा हेतू चित्तांत उत्पन्न होऊन आपल्या मनांत..........
पत्रीं लिहिला पाहिजे. सारांश गोष्टीनें बंधूंत विपर्यास येता तोच-
प्रकार घडोन आला नाहीं. तरी तुमच्या आमच्या स्नेहांत प्रीतिअंतर पडावें
असें नव्हतें. झाल्या गोष्टी त्या कालानुरूप घडोन आल्या.
करूं नये. पुढे पूर्ववत् प्रमाणे प्रीतीची वृद्धि करणें विहित आहे.
लोभ असोंदीजे हे विनंति. "

त्यांचे स्मरणहि

वरील हकिकतीखेरीज करून या ग्रामण्यासंबंधीं आमच्या जवळच्या
कागदपत्रांत खाली दिल्याप्रमाणे आणखी माहिती सांपडते :-
बखर १ ली :-
66
यमाजीपंतानीं ग्रामण्य उभे केलें. ते समयीं चिंतामण भट टकले यांस
सुंदरबा पोतनिसीकडील कारकून याणी आणून दिल्हे. चिंतामणबावा काशीस
जाऊन चार हजार ब्राह्मण कासी वगैरे जमा करून विवाद केला. यमाजीपताचे
म्हणणे एक गोत्रत्रय कर्माधिकारी नीट आहे. बापुजी खंडेराव यांचे म्हणणें
गोत्रे लाऊन द्यावी. त्यामुळे निर्णय न जाला. नानासाहेब पेशवे याणी समारोप
करून ग्रामण्य मोडले.
बखर २ री :-
66

प्रतिनिधीकडून यमाजी शिवदेव वगैरे लहानथोर कारभारी यांचे आईसाहे
बानी आपल्यास मिळोन अधिकारी करून आईसाहेव गोविंदरायास आनकूळ
नाहीं, हे बरे आहे. आईसाहेबास गोविंदराव अनकुळ नाहीत हे चांगले आहे...<noinclude></noinclude>
7bp20vhnn8305aj9ppnp3ftkf4qjt6r
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८३
104
111739
235906
2026-08-21T11:51:13Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235906
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २७ )
सबब व पूर्वी शूद्रास अधिकार नसता वेदकर्माधिकारी राजास केले. आतां
पाठिराखे महाराज नाहींत आणि ब्राह्मण धर्मास बाळाजीपंत नाना वाकडे जाणार
नाहींत जाणून दाहावीस हजार ब्राह्मण गोळा करून ग्रामण्य सजले. त्यामुळे.
गोविंदरायानींही ब्राह्मण कांहीं मेळविले. सभा झाल्या त्यांत त्र्यकर्माधिकारी
चांद्रसेनीय दाल्भ्य चतुष्टय नामाधिकारी चिटनीस खरे ठरले.
एका पत्रांतील मजकूर :-

पूर्वी श्रीमंत छत्रपती महाराज शाहुराज यांचे कारकिर्दीत पंत प्रतिनिधी यांचे
कारभारी माजी सिवदेव याणी त्रिकर्माचा अधिकार नाहीं म्हणोन कलह वाढ-
विला त्याजविशीं माहाराज याहीं सिष्टांची सभा करऊन ग्रंथांतरी शोध पाहून
च्यांद्रसेनीय कायस्थ प्रभु त्रिकर्माचे अधिकारी हे खरे ठरविल्यानंतर येमाजी
सिवदेव याणी आग्रह सोडिला .
म. इ. साधनें, खंड ६, लेखांक ४४४ :—
" ग्रामण्य यमाजी शिवदेव यांनी केले. ते समयीं काशीहून ब्राह्मण व चिंता-
मण गुरुजींनी निराकरण केलें.

म. ई. साधनें, खंड ६, लेखांक ४५९ :-
“ यमाजीपंत १६७१ ज्येष्ठ शुक्ल नाम सन खम सैन मया व अलफ, यांनी
द्वेष उत्पन्न केला, आईसाहेबास मिळोन, गोविंदराव चिटणीस व पेशवे यास
कारभार करूं न देणें विचार, सबब पेशवे याजला कैद करून कासाईचे किल्ल्यावर
ठेविले. वर्षभर होते "
या ग्रामण्यासंबंधानें आणखी जीं पत्र आम्हांस उपलब्ध झाली आहेत
तीं येणेंप्रमाणें :-
पत्र १ लें.
श्री.
श्री मन्माहाराज छत्रपती स्वामीचे शेवेसी.
विनंती शेवक बाळाजी बाजीराव:
प्रधान कृतानेक विज्ञापना येथील वर्तमान ता छ १ रबीलावल पर्यंत स्वामीचे. '
कृपावलोकने करून सेवकाचे वर्तमान यथास्थित असो वि॥ प्रभु चांद्रसेनीय<noinclude></noinclude>
dg5x2hxy8fs48v4on34tocbrpn4sq2y
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८४
104
111740
235907
2026-08-21T11:51:30Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235907
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २८ )
- कायस्थ यांचे ज्ञाती विषयीं राजश्री येमाजीपंत आण्णा यांणी ग्रामण्य केले त्यास
पूर्वीप्रमाणें ज्ञातिधर्म चालत आल्याप्रमाणे चालतात त्यास नवीन खटले वाढले
त्यास चालत आल्याप्रमाणे चालविणार स्वामी समर्थ आहेत. शेवेसी श्रुत होय
हे विज्ञापना.
पत्र २ रें
श्री.
" वेदशास्त्र संपन्न राजमान्य राजश्री उभय क्षेत्र माहुली व परशराम स्वामी
गोसावी यांसी.
प्रति रघुनाथभट पंडितराव नमस्कार विनंती उपरी प्रभु जातीकडे कर्मे
चालावी न चालावी याबद्दल कासी क्षेत्रस्थ वगैरे ब्राह्मण या उभयतांचे बोलण्या-
वरून गुंता पडला होता; परंतु बहुत शास्त्रसंमती ग्रंथावरून निरमत्सर शास्त्री
पंडितांचे विचारे करून पाहता जे धर्म चालत आले आहेत त्याप्रमाणे पुढे
चालावे. प्रभुचें अनादि पहातां क्षेत्रियांत तर प्रभुज्ञाती आहे. केवळ नवी म्हणावी
वादविवाद करावा हें योग्य नाहीं. म्हणोन क्षत्रिय कुलावतंस राजश्री स्वामीनी
उभयताचे ब्राह्मणांस स्पष्ट सांगून समस्त ब्राह्मण क्षेत्रादि यांस पत्रे लिहिण्याची
आज्ञा जाहाली त्याजवरून हे पत्र तुम्हास लिहून पाठविले आहे. तरी पूर्वीप्रमाणे
प्रभुज्ञातीकडे कर्मों व्रतबंधादि, गर्भादान व क्रियादि सर्व परंपरागत चालत आली
आहेत त्याप्रमाणें निरवेध स्वामीचे आज्ञेप्रमाणे चालवीत जावी. पुन्हां बोभाट न
पडे ते करणे मि॥ कार्तिक व ॥ १५ शालिवाहन शके १६७१ बहुत काय लिहिणें
हे विनंती.
जस्टिस रानडेकृत म. स. उत्कर्ष पृ. १५५-१५६.
66
शाहूराजाच्या कारकीर्दीत बाळाजी बाजीराव पेशवे असतांना, ब्राह्मण व प्रभू
यांच्यामध्ये फार दिवसांपासून चाललेला तंटा मिटविण्याचे काम सरकाराकडे
आले. हा तंटा पूर्वीपासून म्हणजे शिवाजीच्या वेळेपासून चाललेला होता असें
दिसतें. व त्या वेळेस तंटा मिटवून जो समेट केला होता, त्याप्रमाणे संभाजी,
राजाराम यांच्या सबंध कारकिर्दीत व शाहू राजाच्या अर्ध्या कारकीर्दीभर व्यवस्था
चालली होती. पण शाहूच्या कारकीर्दीच्या दुसन्या हप्त्यास प्रारंभ झाला, तोंच<noinclude></noinclude>
ebnxarbo897awlmimx4v3ev0rifzrlg
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८५
104
111741
235908
2026-08-21T11:52:17Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235908
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( २९ )
या कलहाग्नीनें पुनः पेट घेतला. त्यावेळेस शिवाजीप्रमाणे शाहूचीहि प्रभूलोकांवर
बहाल मर्जी असे. प्रभूलोकांचा जो इतिहास आहे, त्यांत त्या वेळच्या ब्राह्मणांवर
असा एक आरोप आणिला आहे कीं प्रभूज्ञातीची नालस्ती करून त्यांचा दर्जा
कमी करण्याच्या हेतूनें प्राचीन पौराणिक व सह्याद्रीखंडासारख्या इतर ग्रंथांत
कांहीं नवीन श्लोक ब्राह्मणांनी मुद्दाम घुसडून दिले आहेत. बाळाजी बाजीराव पेशवे
यांचेकडे हा कज्जा आला, तेव्हां पेशव्यांनी शाहूराजाकडे एक खलिता पाठविला.
आणि प्राचीन वहिवाट सोडूं नये, ब्राह्मणांनी उपस्थित केलेले नवीन कज्जे तात्काळ
मोडून टाकावेत, व या बाबतींत ब्राह्मण लोकांना कायमचें व स्पष्ट असे एक सहा
हुकूम सोडावेत, अशी त्या खलित्यांत शिफारस केली. तेव्हां लागलीच शाहूनें
कृष्णानदीच्या तीरावरील खंदें व माहुली येथील समस्त ब्राह्मणवृंदास असे हुकूम
सोडिले कीं, विजापूर येथील बादशाही अमदानीत, तसेंच शिवाजी, संभाजी,
राजाराम व ताराबाई ह्यांच्या कारकिर्दीत त्याचप्रमाणे चालू ( शाहूच्या ) राजाच्या
पूर्व भागांत, ज्याप्रमाणें और्ध्वदेहिक व इतर धर्मकृत्यें ब्राह्मण करीत आले तशींच
त्यांनी पुढेही करावीत. कोणतीही नवीन गोष्ट न करितां पूर्वापार वहिवाट तशीच
चालू ठेवावी. तींत बदल करूं नये. महाराजसरकारचें हैं आज्ञापत्र ब्राह्मणांस
आलें त्याच वेळेस पंडितराव रघुनाथ यांनी सदरहू ब्राह्मणास एक विनंती पत्र
पाठविलें, त्यांत शाहूमहाराजांची आज्ञा काय आहे हे थोडक्यांत लिहून प्राचीन
वहिवाट बंद झाली आहे ती पुनः सुरु करावी अशी त्यांना विज्ञप्ति केली होती.
येणेंप्रमाणे हुकूम सुटले होते, तरी या दोन ज्ञातींमध्ये चाललेल्या भांडणाची
ही गोष्ट कांहीं निवळ कल्पना नाहीं किंवा " सांगण्यांत येते" पैकीं दंतकथा नाहीं.
अगदीं अलीकडे अलीकडे पेशव्यांच्या नोकरशाहीचा अंत होण्याच्या सुमारास खुद्द सांग-
लीस चिंतामणराव पटवर्धनाच्या आश्रयाखाली खोडसाळ मजकूर घुसडलेले ग्रंथ तयार
करण्याची एक गिरणच काढण्यांत आलेली होती. या गिरणीत तयार झालेल्या मालाचे
नमुने आता बरेच उपलब्ध झाले आहेत. शिवाय प्रसिद्ध ग्रंथांचा नायनाट ( confiscate )
करण्याबद्दल पाश्चात्यांनाच कांही हंसायला नको. ग्रँट डफची जबानी पहा :-
111
They
( Chitpawuns) carefully suppress or destroy all copies of the
Syadree kind, where their origin is mentioned, and a respectable -
Bramin of Wâee was, a few years ago, disgraced by Baji Rao for
having a copy of it." (Vol. I p. 8-9, Cambray Ed :)<noinclude></noinclude>
fer8z5d3d1topc0xas6meh2v75xjc44
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८६
104
111742
235909
2026-08-21T11:52:31Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235909
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>9
( ३० )
- खरोखर इतिश्री काही झाली नाहीं. कारण कीं, प्रतिनिधी जगजीवनराव पंडित व
त्यांचे गुमास्ते यमाजी, हे दोघे गृहस्थ सातारा येथे शाहूतर्फे सर्व कामांची व्यवस्था
पहात होते, ते शाहू राजे यांचा अंतःकाळ जवळ येऊन ठेपला होता म्हणून
आज्ञापत्रांत लिहिलेली व्यवस्था मान्य करीनात. पुढे शाहूराजे वारले तेव्हां
बाळाजी बाजीरावानें प्रतिनिधि व त्यांचे गुमास्ते यमाजी या दोघानांही अटकेंत
ठेविलें व प्रभूजातींतील घराण्यामध्ये धर्मकृत्यासंबंधीं पूर्वापार जी वहिवाट
होती तीच चालू ठेवण्याबद्दल हुकूम सोडिले. "
टीप:- खाली दिलेल्या एका अस्सल आज्ञापत्रावरून असें सिद्ध होतें कीं शाहुमहारा-
जांच्या कारकीर्दीत राज्याभिषेक शक २९ म्ह० शा० शक १६२५ इ० स० १७०३ मध्यें
वरील मोठ्या ग्रामण्याशिवाय आणखी एक बखेडा झाला होता आणि त्याचें या आज्ञापत्रानें
निराकरण केलें. या बखेड्याचें विशेष कागदपत्र अझून उपलब्ध व्हावयाचे आहेत.
स्वस्ति श्री राज्याभिषेक शक २९ सर्वजितनाम संवत्सरे कार्तिक बहुल चतुर्दशी क्षत्रिय
कुलावतंस श्रीराजा शाहू छत्रपती स्वामी यांनीं समस्त प्रभु क्षत्रिय यांस आज्ञा केली ऐसीजे.
पूर्वी परशुराम रामचंद्र व रामचंद्र महादेव मांडवगडकर कायस्थ ज्ञाति हे उभयतां श्री क्षेत्रीहून
येऊन समस्त क्षेत्रस्थ ब्राह्मणांची सभा गंधाक्षतेची करून आपले ज्ञातींत कर्मलोप जाहला
आहे तो कर्माधिकार चालत असावा या हेतूनीं सर्व ब्राह्मणांस विनंति केली. नंतर सर्व
ब्राह्मणांनी अनेक प्रकारचे ग्रंथ पाहून यांचे परंपरेची कुळाची व्यवस्थेवरून गागाभट्टकृत
पद्धती अन्वयें मूळ पाहतां चंद्रसेनीय क्षत्रिय यांजपासून यांची संगत लागली, तेव्हां क्षत्रिय
धर्मास अई आहेत असें शिष्ट संमतें ठरून कळविल्यावरून तुमचे ठायीं क्षत्रियत्व संभवतें.
तुम्ही उभयतां मांडवगडचे राहणार. तुम्हांस आचारास निर्णययुक्त सांगितल्यावरून तुम्हांस
ब्राह्मण भोजन करावें अशी इच्छा होऊन विनंति केल्यावरून समस्त ब्राह्मणांनी विचार केला
कीं तुमचे ठायीं क्षत्रियत्व नव्हे म्हणून आरोप आला, यास्तव कर्मे बंद केली. त्याची
व्यवस्था सर्व समजून घेतली. कर्मलोपास्तव कर्म चालविणें विषयीं सर्वांठायीं राजाज्ञा
असावी म्हणून ब्राह्मणांनी विचार करून हुजूर समजाविलें. त्यावरून ब्राह्मणांची नांवनीसीवार
संमतयुक्त पत्र जाहलें तें स्वामीस निवेदन केलें. तें पत्र पाहून येथेंही शिष्ट आहेत त्यांस
मिटवून ग्रंथावारें शिष्टमुखं क्षत्रिय मार्गाचा निश्चय सर्वमुखं ऐकून घेऊन पत्रे देण्याविषयीं
आज्ञा केली आहे, तरी तुम्ही मांडवगडकरी उभयतां क्षत्रियान्वय यांजकडे कर्म क्षत्रियांचें
चालत आहे त्याप्रमाणें यथाशास्त्र चालत आहे त्याप्रमाणे चालवीत जाणें आणि तुम्ही
यांसी अन्नव्यवहार चालत आल्याप्रमाणे चालवीत जाणें जाणिजे. चंद्र २१ माहे सफर
• सुमसमान मयाव आलफ बहुत काय लिहिणें. मोर्तब.”
प्रभुरत्नमाला परिशिष्टांक ५.<noinclude></noinclude>
hjbhjl6ax3e9gsspoxlzzvewvtpafwy
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८७
104
111743
235910
2026-08-21T11:52:53Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235910
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>18 JAN 1994
सातव.
सदाशिव चिमणाजी ऊर्फ भाऊसाहेब यांचें ग्रामण्य.

शके १६८१ इ. स. १७५९
ग्रामण्यांच्या इतिहासाच्या बाबतींत वाचकांनी एक गोष्ट नीट लक्षांत
ठेविली पाहिजे की उपलब्ध कागदपत्रांवरून जीं जीं सालें प्रत्येक ग्राम-
याला दिलेली आहेत, त्याच विवक्षित सालों तें ग्रामण्य झालें असें कांहीं
निश्चित म्हणतां येणार नाहीं; म्हणजे कित्येकांत ग्रामण्याच्या सुरवातीचे
साल दिलेले आढळतें, तर कित्येकांत त्याच्या निराकरणाचे साल नमूद
केलेले आढळतें. त्याचप्रमाणे एकाच्या निराकरणाचा काळ आणि
दुस-
व्याच्या पुनरुज्जीवनाचा काळ यांच्या दरम्यान है ग्रामण्याचे बंड अगदीं
थंड पडले असेल, असेंहि मानण्यास जागा नाहीं. कायस्थ प्रभू ज्ञाति-
विषयीं मत्सरांनी पछाडलेल्या ब्राह्मणांची धुसफूस ही कधिं गुप्त तरी कधि
उघड रीतीनें सतत चालूच असे. एखाद्या जबरदस्ताचें आज्ञापत्र निघाले
की या मत्सरी दिवाभीतांनीं आपापल्या ढोलींत तोंड खुपसून लपावें;
परंतु एखादा प्रभुद्वेष्टा भाऊसाहेब म्होरक्या पुढे आला कीं या दिवाभी-
तांनी भराभर त्याच्या निशाणाखालीं जमा व्हावें.
कल्याणकर लिखिते
यांजकडून आलेल्या ग्रामण्याच्या हकिकतीच्या कागदपत्रांतील खाली
दिलेली दोन अस्सल पत्रे पाहिलीं म्हणजे या विचारसरणीस पुष्कळ पाठ-
बळ मिळतें. त्यांतल्या त्यांत विशेष आश्चर्याची गोष्ट हीच की ६ व्या
ग्रामण्याच्या वेळीं जो नानासाहेब पेशवा प्रभूंच्या ग्रामण्याचा बंदोबस्त
करण्याकरितां शाहूमहाराजांच्या आज्ञापत्राची याचना करतो, तोच नाना-
साहेब ( खालील उतारा नं० ६ पहा. ) शाहूच्या निधनानंतर स्वतःच
ग्रामण्याच्या आगीत तेल ओतण्यास पुढाकार घेतो. यावरून पुण्याचे राजे
या ग्रामण्य बंडाचे खास आश्रयदाते होते, हैं सिद्धच होत आहे; शिवाय
राजाश्रयाशिवाय नुसत्या कोरड्या ब्राह्मण्याच्या जोरावर कोणालाहि इतका
बंडावा करतां येणें केव्हांहि शक्यच दिसत नाहीं.<noinclude></noinclude>
hskhz7d7wc3h3yhhpc4gzwimgkazg28
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८८
104
111744
235911
2026-08-21T11:53:09Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235911
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३२ )
( १ ) " राजश्री दाजी त्रिंबक गोसावी यांसी. सुहसन इसने तीसेन मया व
अलफ सरकारांतून परभु ज्ञातीचा ठराव करून पत्रे सादर केली असतां तुम्ही
भोरास चंपा शष्टीचे उत्साहांत ब्राह्मण भोजन व होमपत्राखेरीज जास्ती कर्मे केली
सबब तुम्हांपासून गुन्हेगारीचे ऐवजी ब्रम्हदंड सु|| सरकारांत ध्यावयाचा करार
केला तो व॥ देणे तो राघो विश्वनाथ गोडबोले याजकडे गाडदी दि ॥ सैद अबदला
वगैरे यास आकार पैकीं रु. २५ पंचवीस हजार देवीले असते तरी पावते करून
पावलीयाचे कबज घेणे. जाणिजे छ. २१ मोहरम.

बार.
( २ ) राजश्री मैराळ त्रिंबक गोसावी यांसी ॥ इसने तिसैन मया व अलफ
सरकारांतून परभुजातीचा ठराव करून पत्रे सादर केलीं असतां तुम्ही भोरास चंपा
शष्टीचे उत्साहांत ब्राह्मण भोजन व चरुहोमपत्राखेरीज जाजती कर्मों केलीं सबब
तुम्हापासून गुन्हेगारीचा ऐवज ब्रह्मदंड सु || सरकारांत ध्यावयाचा करार केला
व॥ देणें तो राघो विश्वनाथ गोडबोले याजकडे गाडदी दिमत सैद अबदला वगैरे
यास आकार रु. २००० दोन हजार देविले असते तरी पावते करून पावली-
याचे कबजा घेणें. जाणीजे छ २१ मोहरम. बार."
इ. स. १७५१ सालच्या एका पत्रावरूनही हीच हकिकत खरी ठरते. ते
पत्र असें :-
( ३ )
पौ श्रावण शु. १० सोमवार शके १६७३ प्रजापति नाम,
तीर्थरूप दादा वडिलांचे शेवेसी-
१५ मे १७५१.
अपत्यें बाळकृष्ण दिक्षित पाटणकर यांचे शिरसाष्टांग नमस्कार विनंती उपरि
येथील क्षेम ज्येष्ठ वदि २ देशचा जाणोन वडिलांच्या आशिर्वादें समस्त सुखरूप
असो विशेष..... कृष्णराव धनुर्धारी याचे पुतणीस २५ हा ऐवज
आणिक पाहिजे. व परभूकडे ब्राह्मण होते त्याणीं प्रायश्चित्तुं केली, त्याचे
रुपये जमा होते ते सर्वोस दिल्हे..........

म. इ. साधनें, खंड ३ रा, पत्रांक ३८४ पृ. ३५८/५९:-
इ. स. १७५२ च्या एका पत्रांत उल्लेख सांपडला तो:-
( ४ ) ".....पर भूनीं प्रायश्चित्तें घेतलीं त्याचे रुपये राजश्री बाला आले
म्हणजे देऊन कबजे पाठवितों......"<noinclude></noinclude>
i11w1ayeddgl00thmrl66z7kxoh3rvu
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/८९
104
111745
235912
2026-08-21T11:53:24Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235912
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३३ )
म. इ. साधनें, खंड ३, लेखांक ४१७, पृ. ३८३.
रा. वि. का. राजवाडे यांच्या यादीत म्हटले आहे ते असे :-
( ५ ) प्रामण्य सदोबा भाऊ साहेबों उल्लेख केला. तें नानासाहेब पेशवे
यांनीं मना केलें. भाऊसाहेब पानपतांत गत झालें.
म. इ. साधनें खंड ६, ले. ४१४.
प्रस्तुत ग्रामण्यांत पुढारपणाचा मान सदाशिवराव भाऊनीं आपल्याकडे
घेतला होता. या ग्रामण्याची सविस्तर हकिकत उपलब्ध नाही. परंतु
इतकें मात्र खास कीं या ग्रामण्याच्या योगानें प्रभुज्ञातीचा छळ बराच
झालेला होता. नाहीं तर सर्व कायस्थ प्रभूसरदारमंडळाला याच वेळीं
एकदम पुण्याच्या चित्पावनी बजबजपुरीला रामराम ठोकून बडोदें, ग्वालेर,
नागपूर, इंदूर, धार, देवास वगैरे संस्थानांत प्रयाण करण्याचे आणखीं
एखादे कारण असेलसें वाटत नाहीं. कित्येक प्रभुमंडळी पुण्यांत राहिली
खरी, परंतु त्यांनीं उदासीन वृत्ति पत्करून राजकारणांतून आपलें आंग
काढूनच घेतलें. यावेळीं पुण्यांत चित्पावन नोकरशाहीच्या वैभवाचा
अगदी कळस झाला होता आणि या कळसावर आणखी मखलाशी करा-
यला करवीरकरांची औट घटकेची पेशवाई भोगणारे सदाशिवराव भाऊ-
साहेब हे आपल्या एका हातांत क्षात्रवृत्तीच्या घमेंडीची तरवार आणि
दुसन्या हातांत भाडोत्री ब्राह्मण्याच्या अभिमानाची ग्रामण्याची चूड घेऊन
पुढे सरसावलेले. सदाशिवराव भाऊच्या उद्दाम स्वभावामुळे प्रभु मंडळी
सहसा त्याच्या कोणत्याहि भानगडीत पडत नसत. प्रभु समाजाबद्दल
ज्वलजहाल द्वेषामुळे आणि ग्रामण्याने त्यांचीं मनें बेसुमार दुखविल्यामुळे
प्रभु सरदारापैकी एकही सरदार - भाऊबरोबर पानपतास गेला नाहीं.
सखाराम हरीस बरोबर द्या म्हणजे पानपतेची मोहीम फत्ते करून येतों
असे भाऊचे नानासाहेबाजवळ आग्रहाचे मागणें होतें. परंतु दादासाहेबानीं
तें साफ नाकारले व स्वतः सखाराम हरीचीहि त्यास संमति नव्हती.
तेव्हां भाजची कांहींतरी समजूत पटावी म्हणून नानासाहेबानें विश्वास-
राव यास बरोबर दिलें. पानपतच्या स्वारीवर निघतांना सदाशिवराव
भोर
3

.<noinclude></noinclude>
391cu9s2cmuxhm7zcdlcxrxndnmgjkf
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९०
104
111746
235913
2026-08-21T11:53:41Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235913
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३४ )
भाऊ सखाराम हरीस दम भरून सांगितलें कीं, "ठीक आहे, हिंदुस्था-
नांतून परत आल्यावर पाहून घेईन. सान्या कायस्थांचीं डोचकीं मेखसूं-
खालीं फोडून टाकीन. याद राखून ठेवा. " यावर सखाराम हरीनें एव-
ढेंच उत्तर दिलें " हिंदुस्थानांतून श्रीमंतांनी आधीं सुखरूप परत यावें;
मग आमचीं डोचक आणि आपले मेखं आहेच. "
यावरून असें वाटतें
की भाऊसाहेब पानपतास जाऊन काय धार मारणार होतें याची या
अनुभवी मुत्सद्यानें चांगलीच अटकळ केली होती. ग्रामण्याचे म्होरके
भाऊसाहेब हिंदुस्थानच्या दौ-यावर गेल्यामुळे ग्रामण्याच्या चळवळ्यांच्या
नाड्या भांखडल्या आणि तें जवळजवळ थंडावलें.
या ग्रामण्याच्या संबंधानें विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ही कीं प्रत्यक्ष
नानासाहेब पेशव्याचा या ग्रामण्यास पाठिंबा मिळतो. यमाजी शिवदेवाच्या
ग्रामण्याच्या वेळीं याच नानासाहेबानें शाहूमहाराजांना प्रभुंच्या तर्फे पत्र
लिहिलें होतें व तडजोडीनें काम होईना तेव्हां त्यानें ग्रामण्याचे पुढारी
जगजीवनराव प्रतिनिधि व त्याचा वेदशास्त्रसंपन्न मुतालीक यमाजी शिवदेव
या दोघांनांहि कैदेत टाकून ग्रामण्य मोडलें. तोच नानासाहेब पेशवा यावेळी
ग्रामण्यास रुकार देतो, ही आश्चर्याची गोष्ट नव्हे काय ? परंतु आश्चर्य
कसले ? छत्रपतीचें राज्य घशांत उतरण्यासाठीं जे नानातऱ्हेचे डावपेंच या
पेशव्यानें लढविलें त्यापैकींच हा एक डाव होता. सुरवातीलाच ग्राम-
ण्याचा पुरस्कार करून प्रभूंच्या विरुद्ध तो जातां, तर त्यास पेशवा-
ईचीं वस्त्रेंच मिळाली नसती. रघोजी भोसले, बाबुजी नाईक बारामती-
कर इत्यादिकांवर मात करून पेशवाईबरोबर नकळत मराठेशाही घशांत
खतरविण्यास नानासाहेबाला चिटणीसांच्याच खुषमर्जीची जरूर होती
आणि चिटणीस पडले कायस्थ प्रभु. तेव्हां नानासाहेबानें ग्रामण्याच्या
भानगडींतून त्यावेळीं अंग कां काढलें होतें याचा उलगडा सहज होतो.
या आमच्या विधानाच्या पुष्टीकरितां वर जीं एक दोन पत्रे दिलीं
आहेत त्यावरून कदाचित कोणाचें समाधान व्हावयाचें नाहीं. म्हणून
खुद्द नानासाहेब पेशव्याचें एक पत्र उपलब्ध झालें आहें तें येथें देतो::
--<noinclude></noinclude>
ghrljnu6c5b30qjk4h461fwwrb3zt0s
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९१
104
111747
235914
2026-08-21T11:57:09Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235914
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>(६) [५०० ]
( ३५ )
श्री.
१४ जुलै १७५९-
पौ॥ आषाढ वद्य १४ शनवार शके १६८१ प्रमाधीनाम संवत्सरें.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे शेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंती उपरि येथील कुशल
जाणोन स्वकीय कुशल लिहित असले पाहिजे. विशेष. पूर्वी परभु याण
आपणांस गोत्रे लावावी येविशीं पत्रे काशीस पाठविली होती. त्यास तीं प
कैलासवासी दीक्षित बाबा यांचे हातास आली होती म्हणून ऐकिलें होतें. त्यावरून
आपणांस तेथून तो पत्रे आणवावी म्हणून सांगितलें होतें आपण श्रीस पत्र लेहून
तों पत्रे आणवितों म्हणोन सांगितले. त्यास श्रीचे पत्राचे उत्तरही आले असेल.
पत्रे आली असली तर तींच पत्रे पाठवावीं, अथवा पत्र दीक्षितबाबाजवळ आल
नसली तरी उत्तर आले असेल ते लिहावे. त्यासारिखें येथें परभां जवळ पत्राचा
शोध केला जाईल. पत्र परभांजवळ न राहावी या करितां शोध करून जाईल.
पत्रे परभांजवळ न राहावी या करितां शोध करून आणावी लागतात. इ ॥
आषाढ वद्य ५ बहुत काय लिहिणे. हे विनंती.

मराठ्यांच्या इ. साधनें, खंड ३ रा, पृ. ४५८/५२.
सदाशिवराव भाऊ पानपतास गेल्यामुळे हें ग्रामण्य निकालांत आले
असे म्हणतां येत नाहीं:-
( ७ ) [ ५२४ ]
श्री.
" वेदशास्त्र संपन्न राजश्री दीक्षितस्वामीचे शेवेसी :-
१२ आगष्ट १७६१.
चरणरज बापुजी महादेव सा नमस्कार विनंती येथील क्षेत्र ......
आहे तसेंच आहे. कळलें पाहिजे.

प्रामण्य
कित्ता. पृ. ४७६-७७.
परंतु पानपतचा एळकोट उडाल्यावर भाऊसाहेब परत येण्याची आशा
-समूळ नष्ट झाली तेव्हांच हैं ग्रामण्य निकालांत निघालें.<noinclude></noinclude>
2b1veimrtyqhxl8huwic7n1ckxzui2y
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९२
104
111748
235915
2026-08-21T11:57:25Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235915
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>ग्रामण्य आठवें.
नारायणराव पेशवे यांचें ग्रामण्य (शके १६९५.
इ. स. १७७३ ).
रामराजे महाराज व माधवराव बल्लाळ पेशवे यांचे कारकीर्दीत यथास्थित
चाललें. ग्रामण्य झालें नाहीं. पुढे नारायणराव बल्लाळ पेशवे झाले. त्यांणी
ग्रामण्य केलें त्यांतील हांशील:-
मार्गे झालेल्या कोणत्याही ग्रामण्यापेक्षां हैं ग्रामण्य फारच जोराचें होतें.
याचे कारण खुद्द राजसत्ताधारी पुरुषानें हें ग्रामण्य उभे केलें होतें.
सातारची राजगादी चित्पावन नोकरशाहीच्या वाळवीनें आधींच पोखरून
ठेविली होती आणि आतां तर खुद्द सातारच्या राजांच्या हातीं यत्किंचि-
तहि सत्ता नसून ते राजकीय कैदखान्यांत ठेविले गेले होते. तरीसुद्धां
पेशवाईची वस्त्रे सातारच्या महाराजांकडूनच पेशवे घेत असत, म्हणून
त्यांच्या शालीनतेबद्दल ' मराठे आणि इंग्रज ' कर्ते त्यांचे कौतुक करतात.
नारायणराव पेशवा हा फार उद्दाम व मगरूर होता. यानें आपल्या
थोड्याच महिन्यांच्या कारकीर्दीत ज्या कांहीं गोष्टीं केल्या त्यांचे सूक्ष्म
निरीक्षण करणारास असे दिसून येईल कीं त्याच्या अंगीं मुत्सद्दीपणाचा
पूर्ण अभाव होता. तो स्वभावानें फार उतावळा, हेकेखोर व हलक्या
कानाचा होता. परिणामाकडे लक्ष न देतां वाटेल तें करण्यास हा बिल-
कूल मागेंपुढे पहात नसे. थोरल्या माधवरावाच्या लक्षांत आपल्या
बंधूंचे हे गुण आले होते व याच्या कपाळीं राज्य नाहीं असें भाकीतहि
त्यांनीं केलें होतें.
नारायणराव बल्लाळ वस्त्रे घेण्याकरितां सातान्यास आले. वस्त्रांसमय मनो-
दयानुरूप कांहीं मतलब महाराजांचें करून द्यावे असें ठरावांत असतां, नारायण-
रावाचा जातीनें शरीर सामर्थ्य व तारुण्यमद प्रकृत ही उद्दाम असा गर्विष्ठ स्वभाव
होता; त्यायोगें वस्त्रांचे समयों कांहीं एक व्हावयाचें नाहीं म्हणोन उरुवुरू बोलले..
यावरून महाराजांची मर्जी जाऊन शिव्या देऊन वस्त्रे देत नाहीं बोलले. तक्तास<noinclude></noinclude>
hg6cum9b2hwtzqv72l8wayqgshq3wuh
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९३
104
111749
235916
2026-08-21T11:57:43Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235916
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३७ )
आण-
लावून घेऊं असें यांगों उतर केले. यावरून महाराजांच्या मुखातून शब्द निघाले जे,
माजोग्या निसंतान होऊन मरशील. तुझें वाटोळे होईल. हा श्राप झाला.
स्त्रीहि फार श्राप करून बोलले. नारायणराव यांणीं वस्त्रें तशींच घेतलीं.
शके १६९४ नंदन नाम संवत्सरे सन सल्ला सबैन मार्गशीर्ष मास. वस्त्रे घेऊन
दरवाज्याबाहेर निघतांच मशालेची झग्यास बत्ती लागून झगा पेटला. आणखी
अपशकून. पुढे हत्तीजवळ गेले जरीपटका हत्तीवर होता. जरीपटक्याची
काठी मोडून तो खालीं पडला. दोन अपशकून झाले. नंतर पुण्यास आले.
फारच अविचारी वागणें उन्मादपणा राज्यमदेही वागूं लागला. लोकांच्या
स्त्रिया चांगल्या त्यांवर बलात्कार हळदकुंकवास नेऊन करावा.
अगर बातमी
लागल्यास पालखी पाठवून जबरी करावी. सातार संस्थानची निंदा करावी.
असा फार अविचारपणा आरंभिला. व प्रभु ज्ञातीवर ग्रामण्याचा प्रारंभ केला.
या ज्ञातीचा तिरस्कार करावा. प्रभु म्हणून संज्ञा चालत आली. राज्य पत्रें
व पेशवे प्रतिनिधि इनामपत्रे वगैरे प्रभु अशीं चालत आलीं तीं यांणीं मोडून
परभू म्हणावें असा प्रारंभ केला. प्रणाम न म्हणतां दंडवत म्हणत जावें. स्नान-
संध्यादि कर्मों करूं नयेत. दुहेरी धोत्रें नेसावी. गंध आडवें लावू नये. घरों
ब्राह्मण येऊं नये.
अशा अनेक तन्हा काढून छलकपणा करण्यास आरंभ केला.
यामुळे नारायणराव यांस पर्याय, बहुत तन्हेनीं बहुतांकडून बोलविले. परंतु
दुराग्रहच मोटा धरिला आपली मंडळीही मोठीमोठी प्रसिद्ध दरबारी वागणार
भीडी त्यांचे वडिलांनी फार बाळगिली. परंतु नारायणराव यांणीं कांहीं मर्या-
दाच ठेविली नाहीं. तेव्हां दरबार सोडून मंडळी आपले घरी बसली. या उपर
या राज्यांत आमची राहण्याची शोभा नाहीं. ज्या गोष्टी कधींच घडल्या नाहीत,
त्या आमच्या वास्तु कशा घडतील. आम्हास निरोप द्यावा. जिकडे मार्ग
फुटेल तिकडे सर्व ज्ञाति जाईल. म्हणत असतां हैं घडावयाचे नाही म्हणोन अड-
चणी
बहुतच पाडिल्या. रामशास्त्री बावापाशीं शास्त्रार्थ पाहून आपण आज्ञा करावी
म्हटल्यावरून शास्त्रावर काय आहे शास्त्र पाहतो कोण तुम्हांस [ वेदोक्त कमेँ
करण्याचा ] अधिकार आहे, परंतु प्रभुत्व यांजपाशीं आहे.
ते सांगतील तसें वर्तण
प्राप्त. असे इकडे म्हणत. त्यांसही ( पेशव्यांस ) या ज्ञातीचे प्रामण्य करूं
नये. ते कांहीं सामान्य अधिकारी नव्हत. विचार पाहून सांगावें असे बोलले.<noinclude></noinclude>
gl4349oi3g7gtudc754hkkqj7gdcye1
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९४
104
111750
235917
2026-08-21T11:57:55Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235917
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३८ )
ब्राह्मण कोंकणांत वगैरे ठिकाण पुण्यांतील
परंतु स्वामित्वापुढे उपाय नाहीं.
मजकूर ऐकून मनस्वी दंगे करूं लागले....
नारायणराव साहेब देवघरांत
वाड्यांत (प्रभु) मंडळीस बोलावून नेलें.
होते; रामशास्त्री बावा व आणखी मंडळी तेथें एकीकडे बसून आपली मंडळीं
गेल्यास आपले जवळ बोलाविलें आणि सांगितलें कीं, तुम्हास दोन चार वेळ
सरकारांतून ताकीद झाली असतां तुम्ही आचरण करितां राहत नाहीं. हल्लीं
सरकारची आज्ञा आहे. है न केल्यास सरकारमर्जी राहणार नाहीं व मान्यता
घातल्याखेरीज तुमचें वाड्यांतून बाहेर जाणें होणार नाहीं. त्याजवर आपले
मंडळीनें निर्भीडपणे उत्तरें केलें कीं, या पाठीमागे असें कोणीच म्हटलें नाहीं,
व कोणी केलें नाहीं. आपण सांगतां यांस कांहीं शास्त्रप्रमाण आहे किंवा
नाहीं; जबरीनें सांगणें तेव्हां जुलूमच म्हणावा. शास्त्रीबावास विनंति
केली कीं, आपण साक्षांत धर्ममूर्ति सर्वास मार्गानी चालवणार. आम्हां-
विशीं सर्व शास्त्र आपले कोठें गेलें. अनन्वित झालें असतां आपण पाहावें, कांहीं
बोलू नये; हा धर्म कोठील. त्याजवर शास्त्री बावानी उत्तर केलें जे, " बाबाहो
तुम्ही म्हणतां तें प्रमाण, परंतु प्रभू कोपला आहे. त्याची मर्जी. ते आज्ञा कर-
तील तीच मान्य म्हणोन वर्तावें हेंच बरें. सांप्रतचा समयच असा आहे. पुढे
कृपाही तेच करतील.
प्रत्यक्ष न्यायमूर्ती रामशास्त्र्यांनीच याप्रमाणें उत्तर देतांच प्रभुमंडळींचा
अगदीं नाइलाज झाला. यादीवर संमतीच्या सह्या घातल्याशिवाय
वाड्यांतून जाऊंच देतना. तेव्हां प्रभुमंडळीनीं नाइलाजास्तव नारा-
यणरावाच्या नऊ कलमी कतव्यावर *मान्यतेच्या सह्या दिल्या. तो
कतबा असाः-

* सत्तेपुढें शहाणपण कसें चालत नाहीं आणि नाईलाजास्तव वाटेल त्या प्रकारच्या कत-
ब्यावर मान्यतेची सही कशी द्यावी लागते याचा अनुभव आमचे परम मित्र संशोधक रा.
रा. पां. न. पटवर्धन यांना अझून यावयाचा आहे. परंतु तो अनुभव कसा असतो या-
बद्दलचा प्रत्यक्ष परिचय त्यांना रा. रा. नरसिंह चिंतामण केळकर हे खात्रीनें नीट पटवून
देतील आणि असल्या बळजबरी नें लिहून घेतलेल्या पत्राची किंमत व्यावहारीक किंवा ऐति-
हासिक दृष्ट्या किती कवडीमोल असते, याचा ते स्पष्ट खुलासा करतील. कारण स्वदेशी<noinclude></noinclude>
9w1y2xu3ii4xvtn5ssz2asim0mzk1l7
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९५
104
111751
235918
2026-08-21T11:58:10Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235918
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ३९ )
१ – वैदिकमंत्रे करून कांहींच कर्म करणार नाहीं.
२ - वैदिक मंत्र येत असतील त्यांचा उच्चार करणार नाहीं.
३- भाताचे पिंड करणार नाहीं.
४ - देवपूजादिक विहित कर्मै पुराणोक्त मंत्र करूनच करूं व ब्राह्मण-
भोजन आपले घरी करणार नाहीं.
५ - शालिग्रामपूजा करणार नाहीं.
६ - ज्या देवास शूद्र जातात त्या देवास जाऊं.
७ - ब्राह्मणांना दंडवत मोठ्यानें ह्मणत जाऊं व आपले जातींतही
दंडवत ह्मणत जाऊं.
८ - वैदिक ब्राह्मण व आचारी व पाणके व शागीर्द ब्राह्मण व ब्राह्मण
बायका चाकरीला ठेवणार नाहीं व आपले घरींही ठेवणार नाहीं.
९ - आमच्या जातीमध्ये संतोषें पाट लावतील त्यांना आम्ही अडथळा
करणार नाहीं.
याप्रमाणें जुलमानें सह्या घेतल्यावर वाड्यांत बोलावून नेलेल्या प्रमुख
प्रभुमंडळींची सुटका झाली. हें वर्तमान प्रभुमंडळास कळतांच त्यांना
अत्यंत उद्वेग होऊन संताप आला असल्यास नवल तें काय ?
याच वेळीं नारायणरावानें दादासाहेब व आनंदीबाई यांचाही मनस्वी
छळ चालविला होता. सूर्यदर्शनाशिवाय अन्नग्रहण करावयाचें नाहीं असा
दादासाहेबांचा नेम होता आणि प्रतिबंध तर इतका कीं त्यांना कित्येक
चळवळीच्या धामधुमीत त्यांना ठाण्याच्या तुरुंगांत असल्याच एका माफीच्या कतब्यावर,
मान्यतेची सही करून मुक्त व्हावे लागले. 'तुम्ही खुशाल सही करा, त्यानें तुमच्या
शीलाला यत्किंचितहि अपाय होणार नाहीं, अशी आम्ही हमी घेतो' अशा अर्थाची जाहीर
नोटीस प्रसिद्ध करणारी केसरी हिंदुपंचासारखीं पत्रे जशीं रा. केळकरांच्या वेळीं होतीं, तशी
वरील कायस्थ प्रभूंच्या अंमदानीत असती, तर त्यांनींहि कदाचित् या नोटीसवजा आगाऊ
प्रायश्चित्ताचा किंवा जाहीर आश्वासनाचा मार्ग खातरीनें स्वीकारला असता.<noinclude></noinclude>
mz4uze8keiuwldpugzqt8glymclokiu
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९६
104
111752
235919
2026-08-21T11:58:28Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235919
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४० )
दिवस सूर्याचें दर्शन होऊं नये. त्यामुळें तीन तीन दिवस उपोषणें पडत
असत. आनंदीबाईस तर अत्यंत नीचपणानें वागविलें होतें. तिला धड
नेसावयासही न देतां नग्नच ठेवण्यांत येई; कारण कदाचित् *लुगड्यामध्यें
कागदपत्र लपवून ठेवील ! इतकेंच नव्हें तर लिहिण्यास संकोच वाटतो-
गुप्त भागांत कागदपत्र ठेवले असतील कीं काय या शंकेने वारंवार तपास
करण्यांत येत असे, असे म्हणतात हा छळ अमानुष नव्हे असें म्हणणारा
मनुष्य सांपडणे कठीण !

दादासाहेब यांस फार प्रतिबंध, व सातान्यासही अडचण व या ज्ञाति-
प्रकरणी निकर्ष असें चाललें, तो भाद्रपद मास आला. तेव्हां दादासाहेबांकडील
राजकारण उभे राहिलें, यांत व्यंकटराव काशी प्रभू यांनी सखाराम हरी प्रभू यांचे
संमतें आनंदीबाई दादासाहेबांची बायको यांजकडे संधान करून सुमेरसिंग, खरग-
सिंग, महंमद ईसफ जमादार, व गार्ग्याचे दिवाण रामचंद्र दाजी प्रभू होते त्यांची
चौकी बंदोबस्त वाड्यांत असे. तेथे फितुरी झाली. व्यंकटराव काशीनों दादा-
साहेबांची हरयुक्तीनें नारायणरावास कैद करून धरावे अशी चिटी सुमेरसिंग
वगैरे गार्दी जमादारास घेतली. ती आनंदीबाईस दिली. गार्दी यांची खात्री
न होय. धरलेले सुटल्यावर आमचा बचाव होणार नाहीं, तेव्हां धरावें ते ध चा
मा आनंदीबाईनें करून मारावं असे करून देऊन चिटी पाठविली; ती सुमेरसिं-
गास दिली. नंतर गर्दी झाली. नारायणराव मारले गेले.
शके १६९५ विजयनाम संवत्सरे सन अर्बा शितैन मया व अल्लफ भाद्रपद
शुद्ध १३. फारच गलबा शहरांत व वाड्यांत झाला. तेव्हां सखाराम हरी बक्षी
व चिंतो विट्ठल वगैरे दादासाहेब प्रकरणी मंडळ वाड्यांत जमा झालें. दादासाहे-
• " मग दादासाहेबांचा बंदोबस्त करून ठेविले देवपूजा करूं देऊं नये; की या
योगाने माझा भाऊ मारला भसें म्हणोन खोलींत ठेविले. दादासाहेब मध्यंप्रदान सूर्य-
दर्शन घेतश्याविना अन्न मक्षं नये, हा नेम होता. खोलींत राहिल्यामुळे पांच उपोषणें
जाहली व दादासाहेबांचे स्त्रियेस लुगड्यांत फंदाचे कागद लपविले या निमित्याने लुगडे
फेडून छळणा करावी.

रा. ब. साने संशोधित नागपूरकर
भोसल्यांची बखर•<noinclude></noinclude>
e49e0unttsx39zkv3mtxzuuz43uo301
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९७
104
111753
235920
2026-08-21T11:58:43Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235920
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४१ )

बांची द्वाही फिरविली. बाहेरील कारभारी नाना, व हरीपंत, वगैरे यांणी - काय
बातमी. फौजेची तयारी वगैरे करून कशी खबर. दोघे खासे, राज्यास गर्दी,
आंत कायम तरी कोणी आहे नाहीं, याकरितां पाहून येण्यास पाठविले. भवा-
नराव प्रतिनिधि व बजाबा पुरंधरे, त्रिंबकराव विश्वनाथ पेठे असे गेले; तों
नारायणराव मारले गेले. दादासाहेब कायम कचेरी झाली. नजरा चालल्या.
पाहून आपल्या जातीची खात्री करून बाहेर येऊन वर्तमान कळविल्यावर फौजा
वगैरे सर्व जाग्यावर जाऊन दादासाहेबांची द्वाही शहरांत फिरली. नंतर दहन
शवार्चे होणे, तयारी झाली. तेव्हां सखाराम हरीनीं विनंती केली कीं आमची ज्ञाती
प्रकरणीं याद नारायणराव यांनीं लिहून घेतली ती आणवून फाडल्याविना शव
नेऊं नये. तेव्हां नानाकडे चोपदार पाठवून यादी आणविली. नानांनीं उत्तर केलें
कीं, यादी रुमालांत आहे, स्नान केल्यावर काढून देतो. तो निरोप परत
आला. त्यावरून पुन: चोपदार दादासाहेबांनी पाठविला कीं, आतांच याद रुमाल
शिवून काढून देणें. तेव्हां नानांनी रुमाल आणून काढून दिली. ती याद
सखाराम हरीस दिली. यांनीं विनंती केली कीं, आपले हातें फाडून द्यावी. तेव्हां
दादासाहेबांनी श्रीकार फाडून दिली, ती व्यंकटराव काशीचे हातीं सखाराम
हरीनें दिली. व्यंकटराव काशीनें ती याद फाडून पूरजे करून शवावर टाकीले.
नंतर शव उचलून पुढील विधि झाला. असा ग्रामण्याचा परिणाम झाला.
येथवर या ग्रामण्याची हकिकत दिली.
आतां इतर प्रसिद्ध पुस्तकांतून
व अप्रकाशित बखरींतून माहिती मिळाली ती देतों :-
(१) रा. वि. का. राजवाडे :-
ग्रामण्य नारायणराव बल्लाळ यांनीं केलें. आठवे महिन्यांत मारले गेले.
दादासाहेबी याद घेतली ती देविली. सखाराम हरीस.
( २ ) ग्रामण्याची अप्रकाशित बखर.
म० इ० साधनें खंड ६ ते ४४४.
नारायण बल्लाळ यांणीं चिटणीस पोतनीस यांस बसवून तुमचे मंडळींत पाट
लागत होते आतां तुम्ही त्या चालीप्रमाणे चालावे म्हणून नऊ कलमे लेहून घेतली.
न द्यावी तरी उठण्याची रजा नाहीं. जबरदस्तीच केली. निरुपाय जाणून लेहून<noinclude></noinclude>
g5lq1p5akz4005depcd5lyfcglxqaa2
पान:ग्रामण्यांचा साद्यंत इतिहास अर्थात नोकरशाहीचें बंड.pdf/९८
104
111754
235921
2026-08-21T11:58:57Z
QueerEcofeminist
918
/* Not proofread */
235921
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="QueerEcofeminist" /></noinclude>( ४२ )
दिल्हे. पुढे राघोबादादानीं सुमेरसिंगास लेहून दिल्हे कीं नारायणरायास धरून
दिल्हे असता तुजला तीन लाख रुपये बक्षिस तलबेशिवाय देऊ. त्यावरून
कबूल करून चिटी लेहून घेतली. नंतर आपसांत जाऊन विचार करिता न साप-
डले तरी आपली बायकामुले ठाणकास देतील याजकरिता सापडेल तर धरून
देऊ नाहीं तरी मारूं. कबूल असेल तरी लेहून द्या. नाहीं तरी आम्ही कबूल
करीत नाहीं. त्यासमयीं आनंदीबाईनी सदाशिवपंत * सोनी कारभारी याजपासोन
धरावे लिहिले होते त्या ध चा मा करविला. ती चिठी घेऊन नारायणराव यास
सुमेरसिंगानी मारिले. ते प्रेत सन्निध असता सखाराम हरीसी दादासाहेबांचा
करार होता कीं नारायणराव हस्तगत जाला म्हणजे तुमची चिटी त्यासमयीं देऊ.
त्याप्रमाणे सखाराम हरीनी विनंती केली. चिटी देवावी. दादासाहेबी तत्काल
परवानगी देऊन चिटी परत देविली.
( ३ ) का. प्र. इ. साधने यांतील " कायस्थ प्रभूंची बखर.

पुढे माधवरावसाहेब समाप्त होऊन नारायणरावसाहेब अधिकारी जाहले. पूर्व
वय, त्यांत यमाजीपंत यांचे ग्रामण्यापैकीं द्वेषबुद्धी ( कांहीं लोक ) होते, त्यांणीं
पूर्वजांचा मनोदय सिद्धीस न गेल्याचा द्वेष ध्यानांत आणोन नारायणरावसाहेब
यासीं अनन्वित फकिका केलेल्या समजवून देऊन ग्रामण्य केलें. आणि प्रभु-
मंडळीपैकीं ( कांहीं लोकांस ) वाड्यांत बोलावून नेऊन जबरदस्तीनें ( त्यांची )
धोत्रें फाडून जानवी तोडातोड करून लिहून घेतले. नंतर नारायणरावसाहेब
थोडकेच दिवशीं परधामास गेले. उपरांतिक दादासाहेब यांजकडे अधिकार प्राप्त
जाहला. ते स्वतः सूज्ञ वेदशास्त्रनिपुण त्याणीं सर्व गोष्ट समजून घेऊन ग्राम-
ण्यांतील मनुष्यांची बहुत निर्भत्सना करून सर्व प्रभुमंडळीस आपआपले कामावर
येण्याविषयीं सांगोन पाठविल्यावरून, अगोदर श्रुत होते व प्रभूनों ही हकिकत सम-
जवून दिल्ही. नंतर ते बोलिले जे, अन्नाहुति केली, त्या सारिखे फळ प्राप्त
जाहले. आतां मागील जाहले गोष्टीचा विधिनिषेध न मानिता स्वस्थ चित्तें आप-
- लाली काजका में करीत जाणें. असें अश्वासन देवून नारायणराव यांणीं जबर-
दस्तीनें पत्र घेतलें होतें तें तेच समयीं आशौचांत आणवून सर्वादेखत फाडून टाकिलें.
कांहीं कागदपत्रांतून " सखारामपंत सोहनी " असा स्पष्ट उलेख सापडतो.<noinclude></noinclude>
lhuagns906jc92finzs3gwry6asnuln