विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.16
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf
106
74682
236051
236007
2026-08-23T02:09:51Z
कल्पनाशक्ती
3813
236051
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
eata2qi8pt6r1f0fdqny51rnz9t07vl
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१९
104
77359
236038
169366
2026-08-22T16:44:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236038
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''अनुक्रम'''}}}}
<center>
{|
|+
|-
| || {{center|{{x-larger|'''पूर्वार्ध'''}}}} ||
|-
| १) || सांगली - एके काळची रम्य नगरी || १
|-
| || {{center|{{x-larger|'''उत्तरार्ध'''}}}} ||
|-
| २) || सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब - चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन || ११
|-
| ३) || महाराष्ट्राचा आद्य नाटककार - विष्णुदास भावे || २२
|-
| ४) || नाट्यसेवेला सर्वस्व मानणारे - नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल || ३१
|-
| ५) || प्रखर देशभक्त नाट्याचार्य - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर || ४३
|-
| ६) || 'आधुनिक अेकनाथ' पारमार्थिक कीर्तनकार - संत कोटणीस महाराज || ५५
|-
| ७) || सांगलीचे लोकविलक्षण धन्वंतरी - आबासाहेब सांबारे || ६७
|-
| ८) || योगभ्रष्ट प्रतिभावान कवी - साधुदास || ७७
|-
| ९) || अुद्योगरत्न - कै. दादासाहेब वेलणकर || ८७
|-
| १०) || शास्त्रीय संगीताचे गाढे व्यासंगी - प्रो. ग. ह. रानडे || ९९
|-
| ११) || केशवसुतसंप्रदायाचे अध्वर्यू - कवी काव्यविहारी || १०७
|-
| १२) || बुद्धिबळपटू - भालचंद्र म्हैसकर || ११७
|-
| १३) || मल्लविद्येचे द्रोणाचार्य - कै. हरि नाना पवार || १२५
|-
| १४) || ज्ञानपीठ पारितोषिक विजेते - वि.स. खांडेकर आणि सांगली || १३२
|-
| १५) || नटवर्य - मामा पेंडसे || १४०
|-
| १६) || मा. अविनाश (श्री. गणपतराव मोहिते) || १५२
|-
| १७) || दान चिंतामणी - राजमतीबाई पाटील || १३७
|-
| १८) || कथाकार श्री. दा. पानवलकर || १७३
|-
| १९) || सय्यद अमीन - एक सालस व्यक्तिमत्व || १८०
|-
| २०) || क्रिकेटपटू - विजय हजारे || १८३
|-
| २१) || बॅडमिंटन युग निर्मिणारे - नंदू नाटेकर || १९३
|-
| २२) || थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन - सांगलीचे जन्मदाते || २०३
|-
| २३) || सांगलीचे भाग्यविधाते - वसंतदादा पाटील || २०९
|-
| २४) || भैरवी...मंगेशकरी सुरांना अभिवादन || २२२
|-
| || {{center|{{x-larger|'''परिशिष्ट'''}}}} ||
|-
| || आणखी काही सांगलीकर, सांगलीतील काही नामवंत संस्था, || २२८ ते २७०
|-
| || प्रेक्षणीय स्थळे, कालपट, सांगली भूषण इत्यादि माहिती. ||
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
7vytn0igzkvuqnj74yn7c44ha38vy99
236039
236038
2026-08-22T16:45:20Z
कल्पनाशक्ती
3813
236039
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''अनुक्रम'''}}}}
<center>
{|
|+
|-
| || {{center|{{x-larger|'''पूर्वार्ध'''}}}} ||
|-
| १) || सांगली - एके काळची रम्य नगरी || १
|-
| || {{center|{{x-larger|'''उत्तरार्ध'''}}}} ||
|-
| २) || सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब - चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन || ११
|-
| ३) || महाराष्ट्राचा आद्य नाटककार - विष्णुदास भावे || २२
|-
| ४) || नाट्यसेवेला सर्वस्व मानणारे - नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल || ३१
|-
| ५) || प्रखर देशभक्त नाट्याचार्य - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर || ४३
|-
| ६) || 'आधुनिक अेकनाथ' पारमार्थिक कीर्तनकार - संत कोटणीस महाराज || ५५
|-
| ७) || सांगलीचे लोकविलक्षण धन्वंतरी - आबासाहेब सांबारे || ६७
|-
| ८) || योगभ्रष्ट प्रतिभावान कवी - साधुदास || ७७
|-
| ९) || अुद्योगरत्न - कै. दादासाहेब वेलणकर || ८७
|-
| १०) || शास्त्रीय संगीताचे गाढे व्यासंगी - प्रो. ग. ह. रानडे || ९९
|-
| ११) || केशवसुतसंप्रदायाचे अध्वर्यू - कवी काव्यविहारी || १०७
|-
| १२) || बुद्धिबळपटू - भालचंद्र म्हैसकर || ११७
|-
| १३) || मल्लविद्येचे द्रोणाचार्य - कै. हरि नाना पवार || १२५
|-
| १४) || ज्ञानपीठ पारितोषिक विजेते - वि.स. खांडेकर आणि सांगली || १३२
|-
| १५) || नटवर्य - मामा पेंडसे || १४०
|-
| १६) || मा. अविनाश (श्री. गणपतराव मोहिते) || १५२
|-
| १७) || दान चिंतामणी - राजमतीबाई पाटील || १३७
|-
| १८) || कथाकार श्री. दा. पानवलकर || १७३
|-
| १९) || सय्यद अमीन - एक सालस व्यक्तिमत्व || १८०
|-
| २०) || क्रिकेटपटू - विजय हजारे || १८३
|-
| २१) || बॅडमिंटन युग निर्मिणारे - नंदू नाटेकर || १९३
|-
| २२) || थोरले चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन - सांगलीचे जन्मदाते || २०३
|-
| २३) || सांगलीचे भाग्यविधाते - वसंतदादा पाटील || २०९
|-
| २४) || भैरवी...मंगेशकरी सुरांना अभिवादन || २२२
|-
| || {{center|{{x-larger|'''परिशिष्ट'''}}}} ||
|-
| || आणखी काही सांगलीकर, सांगलीतील काही नामवंत संस्था, || २२८ ते २७०
|-
| || प्रेक्षणीय स्थळे, कालपट, सांगली भूषण इत्यादि माहिती. ||
|}
</center>
{{nop}}<noinclude></noinclude>
k7qwtrsfnjv4zr2gqra3ihzyqj760ym
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२०
104
77361
236040
173576
2026-08-22T16:48:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236040
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''महिमा सांगलीचा'''}}}}
{{center|<poem>वरदहस्त या नगरीवरती सदा गणेशाचा
शब्दामधुनी कसा वर्णु मी महिमा सांगलीचा ॥ धृ ॥
अनेक शतकांपूर्वी वसली
कृष्णाकाठी रम्य सांगली
सहा गल्लीनी सुखात न्हाली
रंग सुखाला होता पण त्या शुभकर हळदीचा ॥ १ ॥
हरभट कोणी पूर्वज पहिले
वंशज त्यांचे येथे वसले
वैभवात पटवर्धन झाले
चिंतामणि ना राजा येथील, पालक रयतेचा ॥ २ ॥
सांगलीच्या या असंख्य लीला
जुन्या जाणणाऱ्यानी कथिल्या
इतिहासाच्या साक्षी झाल्या
अभिमानाने जपला ठेवा त्या गत काळाचा ॥ ३ ॥
कलागुणांची नाट्यपंढरी
साधुदास ते काव्यविहारी
दिनानाथ, गंधर्व मंडळी
विष्णुदाससह देवल याना मुजरा मानाचा ॥ ४ ॥
चिंतामणीने पाया रचला
'वसंत' हस्ते कळस चढविला
नव्या युगावर ठसा उमटला
महानगरीच्या भविष्यातल्या उज्वल कालाचा ॥ ५ ॥
समाजसेवक राजकारणी
शिक्षण क्रीडा ज्ञानप्रसारणी
इथे चमकले अनेक अग्रणि
वैद्यक, शेती अनेक क्षेत्री ओघ निर्मिताचा ॥ ६ ॥
अशी सांगली सदा चांगली
पुसत उणीवा सतत बहरली
पितृनगरी जी मनी कोरली
अविनाशी तो टिळक राहु दे मानस हा प्रभूचा ॥ ७ ॥</poem>}}
{{right|- प्रभाकर द. खाडिलकर}}<noinclude></noinclude>
64yai5vmw3jnip9vtqu97n9ne3yt533
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२५
104
77368
236041
174196
2026-08-23T01:35:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236041
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|सांगली - एके काळची रम्य नगरी}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}"कृष्णाकाठी कुंडल आता पहिले अुरले नाही" असं कविश्रेष्ठ गोविंदाग्रज तथा राम गणेश गडकरी म्हणून गेलेत. निसर्ग नियमानुसार सृष्टीत परिवर्तनं ही होतच राहणार. लहानपणी गुटगुटीत, गुबगुबीत गालाच्या गोंडस बाळाला, सदासर्वकाळ आपण त्या मनोहर रुपात पाहू शकत नाही. त्याला कोणाचाच अिलाज नाही. तरीपण गोविंदाग्रजांसारखी “कृष्णाकाठी सांगली, नाही अुरली चांगली" असं म्हणण्याची वेळ सांगलीकरांवर कधी न येवो!
{{gap}}सुदैवाने जुन्या-नव्या मंडळींबरोबर थोडी बातचीत केली तर सांगली पार बदलून गेली आहे असं वाटत नाही. आपला मूळचा सतेज चेहरा, या गावानं बराचसा शाबूत ठेवलाय! निदान महाराष्ट्रातील अनेक गावांची पडझड बघितल्यावर असं वाटतं खरं!
{{gap}}एखाद्या साठी-सत्तरीच्या सांगलीकराशी गप्पा मारल्या की जुन्या सांगलीच्या कौतुकात आपण हरवून जातो. कृष्णाकाठचा घोटीव घाट, बाजूची रम्य वनश्री, संथ वाहणारी कृष्णामाई. असंच काठाकाठानं गेलं की सांगली - हरीपूर रस्त्याच्या मध्यावर दिसणारा तो बागेतील गणपती, ती घनदाट चिंचेची बनं, पेरुच्या बागा, आणि थोडं चालल्यावर हरिपूरची वेस ओलांडल्यावर दिसणारा, कृष्णा वारणेचा सुरेख संगम. शेजारी पवित्र आणि गंभीर वातावरण निर्माण करणारं श्रीसंगमेश्वराचं ऐतिहासिक मंदिर. नुसतं त्या संगमाच्या काठावर अभं राहिलं, नदीकाठाला बिलगलेली हिरवीगार झाडं बघितली, अुभ्या पिकांची वाऱ्यानं होणारी सळसळ ऐकली आणि नदीवरुन येणारा गार गार वारा नाकातोंडात भरुन घेतला की पैशा- अडक्याच्या व्यावहारिक जगात अडकलेलं आपलं मन नकळत काव्यमय होतं. मग मुळातच प्रतिभेचं लेणं घेऊन सांगली परिसरातच जन्मलेल्या गोविंद बल्लाळ देवलाना “जय कृष्णा तटवासाऽ" का म्हणावसं वाटणार नाही?
{{gap}}आज ती चिंचेची घनदाट बनं नाहीत, पेरुच्या बागा नाहीत, जागोजागी पाणी अडविल्यामुळे कृष्णेला येणारे महापूर नाहीत, संकष्टीला "धुडडुम" आवाज करुन सगळ्या गावाला चंद्रोदय झाल्याचं सांगणाऱ्या तोफा नाहीत, गणपतीच्या दिवसातले छबिने नाहीत की नगारखाने नाहीत. गतवैभव काळाच्या ओघात नष्ट होणारच. पण<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर|...............................................................|१}}</noinclude>
on69jk6c780fb3bo03p6xzjc67wawud
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२६
104
77369
236042
174235
2026-08-23T01:44:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236042
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आजहि सांगली, चांगली देखणी दिसते ती प्रसन्न गणपतीमंदिरामुळे; भक्कम बांधणीच्या आयर्विन ब्रिजमुळे, 'गणेशदुर्ग' सारख्या भुईकोट किल्ल्यामुळे, वैशिष्ट्यपूर्ण वस्तुसंग्रहालयामुळे, घनदाट आमराईमुळे. हे ठसठशीत “अलंकार” सांगली नगरीच्या अंगावर कुणी घातले? आधुनिक, वैभवशाली सांगलीचा पाया कुणी घातला?
{{gap}}त्यासाठी सांगलीच्या इतिहासाचा मागोवा घ्यायला हवा.
{{gap}}प्रत्येक गावाला स्वतःचा असा काही चेहरा-मोहरा असतो. स्वतःची अशी काही ओळख असते. खरं तर १८०१ सालापूर्वी 'सांगली' ला स्वतःचा असा काही चेहरा नव्हताच. मात्र गावच अस्तित्वात नव्हतं असं नाही. पूर्वीचे संदर्भ बघितले तर इ.स. १०२४ पासून अल्लेख आहेत. 'गोंक' या शिलाहार राजाच्या ताब्यात 'मिरिंच' म्हणजे मिरज आणि 'करहाटक' म्हणजे कराड प्रांत होता. त्यात ही सांगली होती. या भागावर देवगिरीकर यादव, नंतर मुसलमानी राजे यांची सत्ता होती. सांगलीचा ठसठशीत अुल्लेख 'शिवभारत' या संस्कृत काव्यात आढळतो. इ.स. १६५९ मध्ये शिवछत्रपतींचा पराक्रमी सरनौबत नेताजी पालकर याने सांगली, मिरज, ब्रम्हनाळ ही गावे आदिलशहाकडून जिंकल्याचे अुल्लेख आहेत. पेशव्यांच्या काळात इंद्रोजी कदम आणि नंतर पटवर्धन सरदारांकडे या भागाची जहागीर होती. मिरज जहागिरीच्या २२ कर्यातीपैकी सांगली ही एक कर्यात होती. जवळजवळ असलेल्या तीन-चार गावांना मिळून 'कर्यात' म्हणत.
{{gap}}सांगली गावाच्या नावाविषयी अनेक समजुती आहेत. कृष्णा नदीच्या काठी एका अुंचवट्यावरील सहा गल्ली असलेलं गाव म्हणजे 'सांगली' ही त्यातल्या त्यात सर्वमान्य समजूत. काहींच्या मते या गावाचं मूळ नाव 'संगळकी' असं कर्नाटकी पध्दतीचं होतं, तर दुसरी समजूत अशी की कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम गावाला जवळ असल्यानं, मूळ गाव 'संगमी' होतं. मग अपभ्रंश होऊन गावाचं नाव सांगली झालं.
{{gap}}सांगली गावाचा अितिहास म्हणजे तो एक प्रकारे पटवर्धनी पराक्रमाचाच अितिहास. मूळचा ओबडधोबड असलेला सांगली गावाचा चेहरा राजबिंडा आणि वैशिष्ट्यपूर्ण बनला तो या पटवर्धनांमुळेच. १८०१ साली मूळ मिरज जहागिरीतून फुटून पहिल्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यानी आपलं वेगळं राज्य बनविलं, त्याची राजधानी सांगली बनवली, तेव्हापासून या गावाचा, खऱ्या अर्थाने अतिहास सुरु झाला. आज कुणाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण १७६८ च्या सुमारास हरिपूर सांगलीच्या दुप्पट मोठं गाव होतं. त्यावेळी सांगलीची वस्ती एक हजार तर हरिपूरची दोन हजार होती!{{nop}}<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................२}}</noinclude>
ovjoh845s8lyqm0ol5r54jpz46qzgs7
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२७
104
77370
236043
174240
2026-08-23T01:47:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236043
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}सांगली राजधानीचं ठिकाण बनवल्यावर चिंतामणरावानी १८०४-५ च्या सुमारास 'गणेशदुर्ग' या भुईकोट किल्लयाच्या बांधकामास सुरुवात केली. पटवर्धन घराणं गणपतीचे अुपासक. या घराण्याचे मूळ पुरुष, कोकणातल्या कोतवडे गावचे हरभट्ट पटवर्धन. त्यानी तर १२ वर्षे दुर्वांचा रस प्राशन करुन श्रीगणपतीपुळे या क्षेत्रस्थानी श्री गणेशाची निस्सीम अुपासना केली होती. तेव्हा राहायला राजवाडा झाला मग पूजेसाठी गणपतीमंदिर हवंच ना? आज सांगलीचे भूषण समजल्या जाणाऱ्या या श्रीगणपतीमंदिराच्या बांधकामाला इ.स. १८११ साली सुरुवात झाली आणि तब्बल तीस वर्षे ते काम चालू होतं. श्रीगणपतीपंचायतन म्हणजे शिव, सूर्य, चिंतामणेश्वरी, लक्ष्मी-नारायण आणि गणपती. असं पाच मूर्ती असलेलं गणपतीमंदिर अभावानेच आढळते. पाचहि मूर्ती संगमरवराच्या आहेत. हा संगमरवर श्रीक्षेत्र महाबळेश्वराहून, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी आणलेल्या संगमरवरापैकी आहे.
{{gap}}अिकडं गणतीमंदिराचं काम चालू होतं तेव्हा राजकीय क्षितिजावर फार मोठ्या घडामोडी घडत होत्या. १८१८ मध्ये पेशवाईचा पाडाव झाला. तेव्हा ब्रिटीशानी, पेशव्यांच्या सर्व सरदारानी आपल्या चाकरीत यावं असं फर्मान काढलं. चिंतामणराव आप्पासाहेब मोठे मानी पुरुष होते. त्यांनी नोकरी करण्यास नकार दिला. इंग्रजांबरोबर सरळ सरळ भांडण काढले. झालं. इंग्रजांच्या फौजा जनरल प्रिट्झलरच्या नेतृत्वाखाली सांगलीवर चाल करुन आल्या! सांगलीच्या इतिहासात एकमेव असा लढाईचा प्रसंग अुभा ठाकला. अर्थात हा अगदीच असमान सामना होता. आप्तमंडळीनी आणि दरबारी लोकानी चिंतामणरावांची समजूत काढली, तेव्हा कुठं इंग्रजांबरोबरीतील तहास ते तयार झाले. मात्र चाकरी न करण्याचा त्यांचा हट्ट कायम होताच. तडजोड म्हणून त्याना सांगली संस्थानचा हुबळी, तडस, बरडोल (हा सर्व भाग कर्नाटकातील. संस्थानचा काही प्रदेश कर्नाटकात होता) असा एक लाख, अडतीस हजाराचा मुलुख, कायमचा ब्रिटीशांच्या घशात घालावा लागला! अत्यंत स्वाभिमानी असणारे चिंतामणराव नंतरच्या काळातहि या ना त्या कारणांवरुन नेहमी ब्रिटीशांशी संघर्षाच्या भूमिकेतच असत. एरवी मात्र ते कमालीचे प्रजाहितदक्ष होते. सांगलीच्या भरभराटीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पध्दतशीर पेठा रचून सांगलीत व्यापारास त्यानी अुत्तेजन दिले. व्यापाऱ्यांना अनेक सवलती दिल्या. अनेक शास्त्री-पंडित, कलावंत सांगलीत बोलावून घेतले. परंपरेचे अभिमानी असले तरी इंग्रजांमुळे आलेल्या आधुनिकतेचेहि त्याना आकर्षण होते. त्यामुळेच १८२१ मध्ये त्यानी सांगलीत शिळा-प्रेस छापखान्याची स्थापना केली. टांकसाळ सुरु करुन नाणी पाडण्यास सुरुवात केली. त्यांच्यामुळेच मराठी रंगभूमीवर पहिले मराठी नाटक 'सीतास्वयंवर' अभे राहिले. विष्णुदास भावे यांना, त्यानीच पाठीमागे लागून, हे नाटक लिहायला लावले. सुंदर सांगलीचे नारे<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर...............................................................३}}</noinclude>
c1dq1ot2llx0uciztjo4hba57nwhmmk
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८
104
77554
236044
174257
2026-08-23T01:53:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236044
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>सगळेच लावतात. पण सुंदर सांगलीचा पहिला ध्यास त्यांनीच घेतला होता! त्यासाठी त्यांनी सांगलीत जागोजागी बागांची, आमरायांची रचना केली. त्यांच्यानंतर गादीवर आलेल्या तात्यासाहेबांच्या कारकीर्दीत, सांगली म्युनिसिपालिटीची १८७६ मध्ये स्थापना झाली. आधुनिक सांगलीचा खरा पाया घातला गेला, तो मात्र १९०३ साली गादीवर आलेल्या प्रागतिक आणि अुदारमतवादी दुसऱ्या चिंतामणराव आप्पासाहेब यांच्या कारकीर्दीत. सुरुवातीच्या काळात कॅप्टन बर्कसारखा कुशल ॲडमिनिस्ट्रेटर मिळाल्याने सांगली-मिरज रेल्वे १९०७ साली सुरु झाली. १९०८ साली वखारभागाची स्थापना झाली. या दोन्ही गोष्टींमुळे सांगलीतील व्यापाराची आणि अुद्योगधंद्याची वाढ झाली. दांडेकर, भिडे, वेलणकर, लड्डा वगैरे मंडळीमुळे आणि राजेसाहेबांच्या सक्रिय प्रोत्साहनामुळे सांगलीत प्रथमच यंत्रोद्योग-वस्त्रोद्योगाचा पाया घातला गेला. विठ्ठलदास शेडजी, नारायणदास शेडजी, अथणीकर, आरवाडे मंडळींमुळे तेल गाळण्याच्या, हळद पॉलिश करण्याच्या गिरण्या अुभ्या राहिल्या. १९१२ नंतर सांगलीत लोकांना पहिल्यांदा घरातल्या घरात बसून पिण्याचे पाणी मिळू लागले. पाण्यासाठी विहीर जवळ करायची हा शिरस्ता बदलला! १९१४ साली कृष्णा नदीला महापूर आला होता. गावात होड्या चालल्या. तेव्हा पुराच्या पाण्यापासून सुरक्षित अंतरावर वस्ती न्यायचे प्रयत्न सुरु झाले. त्यातूनच शिवाजीनगर (एक्स्टेंशन) भागाकडे वस्ती वाढू लागली. राजेसाहेबांनी स्वस्त किमतीत प्लॉटस् पाडून लोकांना त्या बाजूला घरं बांधण्यास मदत केली. सांगलीची वस्ती वाढू लागली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी सांगलीच्या विद्यार्थ्याला पुण्या-मुंबईकडे धाव घ्यावी लागायची. १९१९ मध्ये राजेसाहेबानी स्वतः पुढाकार घेऊन विलिंग्डन कॉलेजच्या स्थापनेस हातभार लावला. १९२० साल हे वर्ष सांगलीच्या इतिहासात, अशा अर्थानं भाग्याचं की लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी अशा दोन्ही महापुरुषांचे पाय त्या वर्षी सांगलीला लागले. त्या दोघांच्या स्वातंत्र्य चळवळीचे पडसाद सांगलीत अुमटू लागले. कॉलेज शिक्षणामुळे सुशिक्षितांमध्ये स्वातंत्र्याचं वारं खेळू लागलं. परिणामी, दक्षिणी संस्थान प्रजा परिषदेची चळवळ १९२२ पासून सांगलीत जोमाने सुरु झाली. मुळात बर्कसाहेबानी सुरु केलेल्या, रयतसभेला १९३० मध्ये राजेसाहेबानी नियमबध्द स्वरुप दिलं. राजा विरुध्द प्रजा असा संघर्ष सुरु झाला. ब्रिटीश राजवटीमुळे, आणि त्यांच्या दडपणामुळं, वरकरणी विरोध दिसला, तरी आतून प्रजेच्या चळवळीला राजेसाहेबांची सहानुभूतीच होती. त्यामुळेच सांगलीत गुप्तपणे राहून वसंतदादा पाटील यांची स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भूमिगत चळवळ जोमाने सुरु होती. अनेक अखिल भारतीय कीर्तीचे पुढारी, आश्रयासाठी ब्रिटीश सरकारची नजर चुकवून सांगलीत आश्रय घेत असत. अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली अशा १९४२ च्या विख्यात क्रांतिवीरांचे पाय त्यामुळे सांगलीला लागले.{{nop}}<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................४}}</noinclude>
pe53yekgq5fgwz9q99kodp32kw461ee
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२९
104
77555
236045
174254
2026-08-23T01:56:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236045
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}१९२९ साली कृष्णा नदीवर आयर्विन ब्रिज बांधला गेला. त्यामुळे पुण्या- मुंबईच्या बाजूला थेट दळणवळण (मोटाररस्त्याने) चालू झाले. वारंवार येणाऱ्या कृष्णेच्या पुराने होणारे हाल या पुलामुळे तर वाचलेच; खेरीज व्यापार-अुद्योगाच्या वाढीसही ह्या पुलाची रचना अुपकारक झाली. १९३७ साली ज्युबिली इलेक्ट्रिक वर्क्सची स्थापना होऊन सांगलीत प्रथमच वीज खेळू लागली; पहिले वीज कनेक्शन अर्थातच श्रीगणपतीमंदिरास देण्यात आले.
{{gap}}२४ जुलै १९४३ चा दिवस सांगलीच्या इतिहासातील एक गौरवास्पद दिवस. भूमिगत राहून ब्रिटीश सरकारविरुध्द सशस्त्र लढा देणारे वसंतदादा, सांगलीच्या गणेशदुर्ग येथे असणाऱ्या तुरुगांत कैदी होते. त्याच दिवशी त्यानी आपल्या सहकाऱ्यांसमवेत तुरुंगाभोवतीच्या तटावरुन अुड्या मारुन पलायन केले होते. राजकीय संघर्ष तीव्र होत होता. राजेसाहेबानी प्रजेला हळूहळू अधिकार देत देत १९४६ मध्ये राज्यसभेस पूर्ण जबाबदार राज्यपध्दतीचे अधिकार दिले. संपूर्ण देशात चालू असलेल्या संघर्षाला यश येऊन अखेरीस १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. बदलत्या काळाची पावले ओळखून सांगलीच्या राजेसाहेबानी आपणहून विलिनीकरणास मान्यता दिली. ८ मार्च १९४८ रोजी सांगली संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले. पटवर्धन राजघराण्याची जवळजवळ १५० वर्षांची सत्ता संपुष्टात आली.
{{gap}}तत्कालीन मुंबई राज्यात जे अनेक जिल्हे अस्तित्वात आले, त्यातील दक्षिण सातारा जिल्ह्याची सांगली राजधानी झाली. सांगली जिल्हा नंतर अस्तित्वात आला. हातात बंदूक घेऊन ब्रिटीश सत्तेबरोबर लढणारे वसंतदादा आता नवराष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत गुंग झाले. त्यांच्या नेतृत्वाने राजकीय क्षितिजावर सांगलीचे नाव सर्वत्र दुमदुमू लागलं. व्यापारास प्रोत्साहन मिळून नवीन मार्केट यार्ड निर्माण झाले. शेतकरी सहकारी साखर कारखाना अुभा राहिला. १९६३ मध्ये सांगलीला आकाशवाणी केंद्र सुरु झालं. सांगलीचे वसंतदादा नव्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले; एकदा नव्हे तर चारदा! सांगलीचा सर्वांगीण विकास सुरु झाला. वसंतदादाच्या नेतृत्वामुळे सांगलीच्या पूर्वीच्या पटवर्धन घराण्यातील तीन अधिपतींनंतर, ते सांगलीचे चौथे अनभिषिक्त राजेच गणले जाऊ लागले!
{{gap}}म्हणून तर सांगलीसंबंधात बोलताना सर्वजण कौतुकाने म्हणत,
{{center|<poem>"चिंतामणराये वसविली
वसंतराये विकसविली । "</poem>}}
{{gap}}सहा गल्लयांच्या छोट्या झऱ्यानं सुरु झालेला सांगलीचा अितिहास आता महापालिकेच्या महासागरात प्रवेश करता झाला आहे!
{{center|X-X-X}}
{{nop}}<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................५}}</noinclude>
dw0kzwsyx5rhgxqlh3rbtrgn4g7f9jr
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३०
104
77556
236046
174262
2026-08-23T02:00:51Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236046
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}आज जे सांगलीचं आधुनिक आणि प्रगत असं स्वरुप दिसत आहे त्याची अुभारणी निःसंशय स्वातंत्र्योत्तर काळात झाली. हे जितकं खरं, तितकंच, त्याची मुहूर्तमेढ संस्थानी काळात पटवर्धन राजकुटुंबाच्या दूरद्दष्टीने झाली हेहि खरं. १९०८ च्या सुमारास धनी वेलणकरांची 'श्री गजानन वीव्हिंग मिल' सुरु झाली. पाठोपाठ लड्डांची बालाजी मिल सुरु झाली. दांडेकर-भिडे मंडळींनी लोखंडी सामानाचे कारखाने सुरु केले. आरवाडे, अथणीकर मंडळीमुळे तेल गिरण्या अभ्या राहिल्या. सांगलीचे खऱ्या अर्थाने औद्योगीकरण सुरु करण्यात या मंडळींचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विधायक कार्यात स्वतःला झोकून दिलेल्या वसंतदादानी, औद्योगिक विकासाला जोराची चालना दिली. त्यानी पुढाकार घेऊन सांगली- माधवनगर रस्त्यावर औद्योगिक वसाहतीची स्थापना केली. त्यात २५० च्यावर विविध अद्योगधंदे अुभे आहेत. पुढे शासनाने एम. आय. डी. सी. च्या माध्यमातून निव्वळ अुद्योगधंद्यासाठी ५०० प्लॉटस् राखून ठेवले. त्यापैकी दोनेकशे प्लॉटस्-वर कारखाने कार्यरत झाले आहेत. फूड प्रॉडक्टस्, कन्फेक्शनरी, औषधे, टेक्स्टाईल्स्, स्टील कंटेनर्स, साबण, बॅटरी सेल्स, सर्जिकल बँडेज असे विविध प्रकारचे अुत्पादन तेथे सुरु आहे. या छोट्या अुद्योगांशिवाय टाटा मेटल इंडस्ट्रीज, स्वीट कन्फेक्शनरी, अजय केमिकल्स, दारम फॉर्मास्युटिकल्स, तुंगा आर्मडाईज, नव महाराष्ट्र चाकण ऑईल मिल्स, जयराज टेक्स्टाईल अशा मोठ्या स्वरुपाचे अुद्योगधंदेहि आहेत. वसंतदादांसारख्या सहकार- महर्षीमुळे सांगली गाव आणि प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळेच तयार झाले. त्यामुळे साखर कारखाने, सूतगिरण्या, तेलबिया गाळणाऱ्या गिरण्यांची रेलचेल झाली.
{{gap}}पण सांगलीच्या अुद्योगांविषयी एकच एक वैशिष्ट्य सांगायची वेळ आली तर फक्त हळद-अुद्योगाविषयीच सांगायला लागेल. सांगलीचा हळद वायदे बाजार हा संपूर्ण देशात एकमेव आहे. या वायदेबाजारामुळे भारताच्या औद्योगिक नकाशावर सांगलीला एक अढळ स्थान प्राप्त झाले आहे. सांगलीच्या परिसरात पिकविली जाणारी 'राजापुरी' हळद ही एक अुत्तम प्रकारची हळद आहे. हळदीची साठवण करण्याची अुत्तम सोय सांगली परिसरात असणे ही या वायदे बाजारामागची मुख्य जमेची बाब आहे. हळद पावसाच्या पूर्वी साठवावी लागते आणि कीड लागू नये म्हणून जमिनीखालीच ठेवावी लागते. सुदैवाने अशी अनुकूलता सांगली परिसरातील सांगलीवाडी व हरिपूर येथील नदीकाठच्या जमिनींमध्ये आहे. जमिनीखाली करण्यात आलेल्या साठ्याला 'पेव' म्हणतात. अशी नैसर्गिक पेवे हरिपूर व सांगलीवाडीच्या कृष्णाकाठांवर, दोन हजाराचे वर आहेत. एका पेवात अदमासे २०० पोती हळद साठवता येते. आंध्र प्रदेश, कर्नाटक,<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर.............................................................६}}</noinclude>
rmstnrhzbdzvyb7lts682cdofn90gah
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३१
104
77557
236047
176646
2026-08-23T02:03:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236047
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>तामीळनाडू भागातूनसुद्धा सांगलीत हळदीची आवक होते.
{{gap}}सांगलीच्या या हळद वायदे बाजाराला १९०५ पासूनचा दीर्घ इतिहास आहे. १९४० पर्यंत हा वायदेबाजार, चेंबर ऑफ कॉमर्स, सांगलीतर्फे चालवला जात असे. त्यानंतर तो दि स्पायसेस ॲण्ड ऑईलसीडस् एक्श्चेंज लि. सांगली या वायदे व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संस्थेमार्फत चालवला जातो. रोज लाखो रुपयांचा व्यवहार करणारा हा वायदेबाजार शेअर बाजाराच्या धर्तीवर चालतो. सामान्य लोकाना तो एक प्रकारचा सट्टा वाटला तरी सरकारची मान्यता असलेला तो देशातील एकमेव मान्यताप्राप्त आणि प्रतिष्ठित वायदेबाजार आहे.
{{gap}}या हळदीनं, सांगलीचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलंय.
{{center|X-X-X}}
{{gap}}व्यावहारिक जगतात सांगलीचं नाव अनेकविध अुद्योगांनी मोठं केलं असलं, तरी 'सांस्कृतिक सांगली' हा खरा सांगलीचा आत्मा आहे. महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक जगतात सांगलीच्या नावाला जी प्रतिष्ठा आहे, आदर आहे तो सांगलीच्या सांस्कृतिक समृध्दीमुळेच, हे निर्विवाद सत्य आहे.
{{gap}}सांस्कृतिक दालनांपैकी सर्वप्रथम मनःपटलावर अुमटते ती सांगलीची नाट्यपरंपरा. सांगलीचे विष्णुदास भावे हे मराठी नाटकांचे आद्य जनक. १८४३ साली त्यानी 'सीतास्वयंवर' हे नाटक रंगभूमीवर आणलं. पुढील दीडशे वर्षात मराठी नाट्यसृष्टी चांगली फोफावली. म्हणून मराठी नाटकांची गंगोत्री असलेल्या सांगलीचं माहात्म्य आगळंच. या विष्णुदास भावे यानी ५२ नाटके मराठी रंगभूमीवर आणण्याचा पराक्रम केला. यापेक्षाहि मौजेची गोष्ट म्हणजे त्यानी १८५४ च्या सुमारास 'राजा गोपीचंद' या हिंदी नाटकाचा प्रथम प्रयोग रंगभूमीवर केला. त्यामुळे हिंदी रंगभूमीचे जनक म्हणूनहि त्यानी सांगलीचे नाव अखिल हिंदुस्थानात गाजवलं. त्यानंतर गोविंद बल्लाळ देवल या दुसऱ्या सांगलीपुत्राने 'शारदा', 'संशयकल्लोळ' सारख्या नाटकांनी मराठी रंगभूमी गाजवली. त्यावर कळस चढवला तो सांगलीच्याच आणखी एका सुपुत्राने. त्याचं नाव नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. प्रखर देशाभिमानी, ज्वलंत पत्रकार असलेल्या या लोकमान्य टिळकांच्या पट्टशिष्याने आपल्या संगीत आणि गद्य नाटकांनी मराठी नाट्यरसिकांना मंत्रमुग्ध करुन टाकले. म्हणून तर खाडिलकरांच्या कालखंडास मराठी रंगभूमीचे 'सुवर्णयुग' म्हणतात. यापाठोपाठ राम गणेश गडकरी यांचे शिष्य म्हणून गाजलेले न.ग. कमतनूकर हे पण सांगलीचेच नाटककार. केशवराव दाते यांच्या प्रेरणेने प्रतिवर्षी ५ नोव्हेंबर हा 'रंगभूमी दिन' सांगलीला थाटामाटात साजरा केला जातो. गणपतराव बोडस, चिंतामणराव कोल्हटकर,<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................७}}</noinclude>
9sol82vn1rf1zqtzdjp7ot6keljezh0
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३२
104
77558
236048
176649
2026-08-23T02:05:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236048
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>चित्तरंजन कोल्हटकर, मामा भट, मामा पेंडसे, गणपतराव मोहिते (अविनाश) याजपासून तो अलीकडच्या यशवंत केळकर, गिरीश ओक यांजपर्यत अनेक नाट्यकलाकारांचा सांगलीशी घनिष्ट संबंध आला. दीनानाथ मंगेशकर, विश्राम बेडेकर यासारख्या दिग्गजांचे सांगलीत वास्तव्य होते. लता, आशा, हृदयनाथ या मंगेशकर भावंडाचं बालपण सांगलीतच गेलं. या सर्व बाबींमुळे सांगलीला "नाट्यपंढरी” म्हणून कौतुकाने गौरवले जाते. अनेक नाट्यव्यवसायी, वारकऱ्याच्या श्रद्धेने सांगलीत येऊन आपली नाट्यसेवा या 'पंढरी'त सादर करतात.
{{gap}}सांगलीला ‘नाट्यपंढरी' म्हणून गौरवले जाते तसेच अनेक भाविक भक्तांना सांगली ही "कीर्तनपंढरी” वाटते. खुद्द सांगलीकर पटवर्धन मंडळी गजानन भक्त, कीर्तन-प्रवचनाला मुक्तपणे प्रोत्साहन देणारी. आजुबाजूच्या परिसरात नरसोबावाडी, औदुंबर, ब्रम्हनाळ यासारखी तीर्थक्षेत्रे. ह्या साऱ्या अनुकूल गोष्टी असल्या तरी सांगली आणि कीर्तन हा 'द्वंद्वसमास' रुढ झाला तो संतश्रेष्ठ तात्यासाहेब कोटणीस महाराजांच्या ३८ वर्षांच्या अखंड कीर्तनाने. कोणतीही बिदागी न घेता कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम त्यानी केले. मामामहाराज केळकर आणि दासराममहाराज केळकर यानी हा वारसा अखंडपणे जपला. रामानंदमहाराज खटावकर, त्यांचे परात्पर गुरु श्री सदाशिवमहाराज, बाबासाहेब मुजुमदार, सत्यव्रततीर्थ, मौनीबाबा, श्रीआनंदमूर्ती, कृष्णा परीट, अप्पाराव पोवार, अण्णाबुवा, धोडींराममहाराज, श्री नारायणमहाराज मळणगावकर, बुधगांवचे गुंडुबुवा, म्हादबा महाराज पाटील अशा अनेक थोर मंडळींनी सांगलीत कीर्तन जागवले. त्यामुळे भाविक मंडळी “सांगली भूमी कीर्तनाची । मस्तके लवती साऱ्यांची” असे श्रद्धेने म्हणतात.
{{gap}}कोल्हापूरअितकी नसली तरी सांगलीचीसुद्धा खास अशी कुस्तीपरंपरा आहे. व्यंकप्पा बुरुड आणि हरीनाना पवार यानी या कुस्ती क्षेत्रात सांगलीला नाव मिळवून दिले. हरीनानांनी तर मल्लोपासनेचे विद्यापीठच अुघडले. बलोपासनेइतकेच सद्वर्तणुक आणि सच्चारित्र्य याना ते महत्त्व देत; आणि त्यादृष्टीने कुस्तीगीर तयार करीत. हिंदकेसरी मारुती माने, ज्योतिराम दादा सावर्डे, विष्णु सावर्डे यांनी कुस्तीपरंपरेचे जतन केले. आजहि सांगलीत कुस्त्यांचा फड अभा राहिला की एकेक लाख लोक गर्दी करतात. बदलत्या काळानुसार मॅटवरच्या कुस्तीला महत्त्व आले असले तरी!
{{gap}}खेळांच्या परंपरांचा विषय निघाला की आजच्या क्रिकेट या जबरदस्त लोकप्रिय खेळाची आठवण होते. सांगलीने या खेळाला एक विश्वमान्य असा खेळाडू दिला. त्याचे नाव विजय हजारे. नामांकित बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर आणि विजय हजारे या दोघांच्याहि खेळाची जडणघडण सांगलीतच झाली. या मैदानी खेळांबरोबरच बुद्धीबळासारख्या बैठ्या पण विलक्षण कौशल्याच्या खेळामध्येसुद्धा सांगलीचे नाव<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................८}}</noinclude>
s00o6dwn09iu64v7uljoknlkxz2193l
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३३
104
77559
236049
176652
2026-08-23T02:07:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236049
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>भालचंद्र म्हैसकरांसारख्या सांगलीकराने विश्वपटलावर नेऊन ठेवले आहे. बाबासाहेब बोडस, मोरभट मेहेंदळे, विनायकराव खाडिलकर, गोपाळराव मुजुमदार, तमण्णा पडसलगीकर या 'कालच्या' बुद्धीबळपटूंपासून तो आजच्या भाऊराव पडसलगीकर, भाग्यश्री साठे (ठिपसे), स्वाती घाटे, या सर्वानी बुद्धीबळाच्या खेळात सांगलीचे नाव दुमदुमत ठेवलं आहे.
{{gap}}शैक्षणिक क्षेत्रात सांगलीचा दबदबा तर पहिल्यापासूनच होता. याचं बरंचसं श्रेय पटवर्धन संस्थानिकांकडे जाते. १८६१ मध्ये सांगलीत सार्वजनिक शिक्षणाला सुरुवात झाली. लागलीच दोन वर्षांनी मराठी शाळा निघाली. १८६५ मध्ये शास्त्रशुद्ध वेदशास्त्र शिकवले जावे म्हणून वेदशास्त्र शाळेची स्थापना झाली. त्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, न्याय, व्याकरण, ज्योतिष अशी शास्त्रे शिकवणाऱ्या पाच वेदशाळा काढण्यात आल्या. १९१० मध्ये प्राथमिक शिक्षण सांगलीत आणि संपूर्ण सांगली संस्थानात मोफत तर झालेच पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे ते सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे सांगली हे सुशिक्षिताचं गांव म्हणून पुण्याखालोखाल ओळखले जाऊ लागले. या वेदशास्त्राच्या प्रभावामुळे संस्कृत विद्येचा प्रसार सांगलीत मोठ्या प्रमाणावर झाला. देवधरशास्त्री, पाटीलशास्त्री, के. जि. दीक्षित अशा नामवंत संस्कृत-तज्ञांनी तत्कालीन मुंबई विश्वविद्यालयाच्या परीक्षांमध्ये, जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती विजेत्यांची गौरवशाली परंपराच सांगलीत निर्माण केली. धारवाड ते पुणे अशा विस्तृत पट्टयात कॉलेज शिक्षणाची सोय नव्हती, तेव्हा स्वतः पुढाकार घेऊन श्रीमंत राजेसाहेबानी सांगलीत १९१९ मध्ये विलिंग्डन कॉलेजची स्थापना करवली. १९३३ मध्ये निव्वळ मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा या हायस्कूलची स्थापना झाली. १९४७ मध्ये वालचंद इंजिनिअरींग कॉलेजची स्थापना झाली. १९६१ साली या भागातील (कोल्हापूर, बेळगांव वगळता) पहिले शिक्षणशास्त्र महाविद्यालय, सांगली शिक्षण संस्थेने सुरु केले. तसेच १९९८ मध्ये याच संस्थेने सांगली व सोलापूर जिल्ह्यासाठी पहिलीच “सैनिक शाळा" सुरु केली. आज तासगांव या पहिले परशुराम भाऊ पटवर्धन यांच्या ऐतिहासिक नगरीत दत्तमाळावर सर्वसोयीनी सुसज्ज अशी ही सैनिकशाळा पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे.
{{gap}}स्वातंत्र्यपूर्व काळात अशा शैक्षणिक घडामोडींचे अप्रूप होतं. स्वातंत्र्योत्तर काळात तर शिक्षणक्षेत्रात आमूलाग्र प्रगती झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी संपूर्ण जिल्ह्यात फक्त ३ महाविद्यालये होती, ती आता पन्नासच्या वर गेली आहेत. “अुदंड झाले शिक्षण" अशी सध्याची अवस्था आहे.
{{gap}}स्वातंत्र्य मिळाल्यावर सर्व क्षेत्रात, विशेषतः शेती, अुद्योग, व्यापार आदी<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................९}}</noinclude>
dgya0ote01skpsqdduk0iyk9cidsxey
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३४
104
77560
236050
176655
2026-08-23T02:09:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236050
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>क्षेत्रात भरघोस प्रगती झाली ही अत्यंत अभिमानास्पद बाब खरीच पण सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास झपाट्याने होऊ लागला ही मोठी चिंतादायक गोष्ट आहे. जुन्या काळात, सांगलीची हवा आणि सांगलीचं पाणी यांची कीर्ती अितकी होती. की बाहेरगांवचे अनेक लोक या शांत आणि रम्य नगरीत मुद्दाम घरे बांधून रहायला येत. आता शहराची झालेली बेसुमार वाढ, नियम धाब्यावर बसवून झालेली अनधिकृत बांधकामे, खाचखळग्यांचे रस्ते, सांडण्याची दुरवस्था यामुळे हवा प्रदूषित झाली; शेरीनाल्यामुळे पाणी खराब झालं आगि औद्योगिक अशांतता, बेकारी, काळाबाजारवाले, मटका, दारु, एकतर्फी प्रेमापोटी झालेल्या निर्घृण हत्या, अशा अनेक कारणांनी, सरोवरासारख्या शांत असलेल्या सांगलीची विलोभनीय शांतता धोक्यात आली! दिवसाढवळ्या झालेले खून, दरवडे, बलात्कार, मारामाऱ्या, यांमुळे "मुंबई आली रे अंगणी" अशी सांगलीची अवस्था झाली आहे. "स्वच्छ सांगली, सुंदर सांगली" असे घोषणांचे कितीहि ढोल वाजवले गेले तरी प्रत्येकाच्या 'मनात' आधी 'सुंदर सांगली' अवतरली पाहिजे. तर प्रत्यक्षात अवतरणार!
{{gap}}"कृष्णाकाठी सांगली, नाही अुरली चांगली" असं म्हणायची दुर्दैवी वेळ यायला नको असेल, तर प्रत्येक अभिमानी सांगलीकरानेच कंबर कसायला हवी.
{{gap}}सांगलीचं नाव अुज्ज्वल करणाऱ्या भूतकाळातील थोर सांगलीकरांना तीच खरी आदरांजली ठरेल!
{{gap}}(शेवटी एक परिशिष्ट जोडून त्यामध्ये सांगलीतील काही अग्रगण्य संस्था आणि नामवंत सांगलीकर यांचेविषयीची माहिती देण्यात आली आहे.)
{{center|●●●}}
{{nop}}<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................१०}}</noinclude>
3h098rb9afa8wp1k8x2qqjq2uuc0569
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३५
104
77561
236053
176657
2026-08-23T02:11:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236053
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब'''}}<br>
{{xxx-larger|'''कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}७ मार्च १९४८ चा दिवस.
{{gap}}दुसऱ्या दिवशी सांगली संस्थान भारतीय संघराज्यात विलीन व्हायचे होते. १८०१ पासून जवळजवळ दीडशे वर्षे पटवर्धन राजघराण्याची सांगली संस्थानावर सत्ता चालू होती. सांगली संस्थानचा शेवटचा राजा राजवैभवाचा त्याग करून चारचौघांसारखा सामान्य नागरिक होणार होता. राजेसाहेबांच्या, सांगली - माधवनगर रस्त्यावरील, माळबंगल्यावरच्या निवासस्थानी अनेक प्रजाजन जमले होते. श्रीमंत राजेसाहेबांचे आगमन होताच त्यांना पाहून अनेक उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू कृतज्ञतेचे होते. पित्याच्या वत्सलतेने पालनपोषण करणाऱ्या राजाला निरोप देताना उत्स्फूर्तपणे आलेले मायेचे ते कढ होते. त्यांचे डोळ्यातील न खळणारे ते पाणी पाहून राजेसाहेब मनोमन गहिवरले. पण क्षणात स्वतःला सावरून म्हणाले, अशा मंगल प्रसंगी अश्रू काय म्हणून? अुद्यापासून स्वतंत्र भारताचा नागरिक होण्याचे भाग्य मला मिळत आहे. याबद्दल आपणा सर्वांना आनंदच वाटला पाहिजे” त्यांचे हे सहजोद्वार ऐकताच सर्वांची मने हेलावली. एक अस्फुट हुंदका बाहेर आला.
{{gap}}हा थोर मनाचा राजा म्हणजे सांगली संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. चिंतामणराव अर्फ आप्पासाहेब पटवर्धन, जिथं अमर्याद सत्ता होती तिथंच सामान्य नागरिक म्हणून राहायचं, ही पचनी पडायला अवघड अशी वस्तुस्थिती होती. पण सांगलीच्या राजेसाहेबानी "इदम् न मम" म्हणत, अंगावरचे वस्त्र बदलावे इतक्या सहजतेने आपले राज्य प्रजाजनांच्या झोळीत टाकले. हे त्याना जमले याचे एक कारण म्हणजे त्यांची पराकोटीची पारमार्थिक वृत्ती. आयुष्यभर ते अध्यात्मच जगले.
{{gap}}श्रीमंत राजेसाहेबांचा जन्म १४ फेब्रुवारी १८९० सालचा. त्यांचे मूळ नाव विनायकराव चिंतामणराव अर्फ भाऊसाहेब पटवर्धन. पटवर्धन घराण्याचे मूळ पुरूष हरभट पटवर्धनानी दहा वर्षे दुर्वाचा रस प्राशन करून श्रीगजाननाची अखंड सेवा केली होती. या भक्तीचा वारसा समस्त पटवर्धनांत झिरपत आला होताच. त्यात राजेसाहेबांच्या मातोश्री माईसाहेब यानी आळंदीच्या श्रीनृसिंहसरस्वती यांचा अनुग्रह घेतला होता. त्यामुळे धार्मिक वातावरणाचा ठसा, बालवयातच राजेसाहेबांच्या मनावर<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................११}}</noinclude>
jqhuiilc89kayyfnfn95xnqi7kyf6dr
236054
236053
2026-08-23T02:12:27Z
कल्पनाशक्ती
3813
236054
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{x-larger|'''सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब'''}}<br>
{{xx-larger|'''कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}७ मार्च १९४८ चा दिवस.
{{gap}}दुसऱ्या दिवशी सांगली संस्थान भारतीय संघराज्यात विलीन व्हायचे होते. १८०१ पासून जवळजवळ दीडशे वर्षे पटवर्धन राजघराण्याची सांगली संस्थानावर सत्ता चालू होती. सांगली संस्थानचा शेवटचा राजा राजवैभवाचा त्याग करून चारचौघांसारखा सामान्य नागरिक होणार होता. राजेसाहेबांच्या, सांगली - माधवनगर रस्त्यावरील, माळबंगल्यावरच्या निवासस्थानी अनेक प्रजाजन जमले होते. श्रीमंत राजेसाहेबांचे आगमन होताच त्यांना पाहून अनेक उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू कृतज्ञतेचे होते. पित्याच्या वत्सलतेने पालनपोषण करणाऱ्या राजाला निरोप देताना उत्स्फूर्तपणे आलेले मायेचे ते कढ होते. त्यांचे डोळ्यातील न खळणारे ते पाणी पाहून राजेसाहेब मनोमन गहिवरले. पण क्षणात स्वतःला सावरून म्हणाले, अशा मंगल प्रसंगी अश्रू काय म्हणून? अुद्यापासून स्वतंत्र भारताचा नागरिक होण्याचे भाग्य मला मिळत आहे. याबद्दल आपणा सर्वांना आनंदच वाटला पाहिजे” त्यांचे हे सहजोद्वार ऐकताच सर्वांची मने हेलावली. एक अस्फुट हुंदका बाहेर आला.
{{gap}}हा थोर मनाचा राजा म्हणजे सांगली संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. चिंतामणराव अर्फ आप्पासाहेब पटवर्धन, जिथं अमर्याद सत्ता होती तिथंच सामान्य नागरिक म्हणून राहायचं, ही पचनी पडायला अवघड अशी वस्तुस्थिती होती. पण सांगलीच्या राजेसाहेबानी "इदम् न मम" म्हणत, अंगावरचे वस्त्र बदलावे इतक्या सहजतेने आपले राज्य प्रजाजनांच्या झोळीत टाकले. हे त्याना जमले याचे एक कारण म्हणजे त्यांची पराकोटीची पारमार्थिक वृत्ती. आयुष्यभर ते अध्यात्मच जगले.
{{gap}}श्रीमंत राजेसाहेबांचा जन्म १४ फेब्रुवारी १८९० सालचा. त्यांचे मूळ नाव विनायकराव चिंतामणराव अर्फ भाऊसाहेब पटवर्धन. पटवर्धन घराण्याचे मूळ पुरूष हरभट पटवर्धनानी दहा वर्षे दुर्वाचा रस प्राशन करून श्रीगजाननाची अखंड सेवा केली होती. या भक्तीचा वारसा समस्त पटवर्धनांत झिरपत आला होताच. त्यात राजेसाहेबांच्या मातोश्री माईसाहेब यानी आळंदीच्या श्रीनृसिंहसरस्वती यांचा अनुग्रह घेतला होता. त्यामुळे धार्मिक वातावरणाचा ठसा, बालवयातच राजेसाहेबांच्या मनावर<noinclude>{{rule}}
{{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................११}}</noinclude>
mkbfvfg37g8jqlghi4rbtp9o7v039ky
अनुक्रमणिका:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf
106
104089
236037
235860
2026-08-22T12:30:11Z
कल्पनाशक्ती
3813
236037
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=लंकेचें वर्णन व वृतांत
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
j91mivp5r1cqonajfzxgyftjztx9rhd
236059
236037
2026-08-23T07:38:59Z
कल्पनाशक्ती
3813
236059
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=लंकेचें वर्णन व वृतांत
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
dqr7isy5qzd6jif44mvfkcryre09w2e
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४३
104
111832
236036
236030
2026-08-22T12:29:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236036
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 43 भिंतीवर आपटणाऱ्या फेसाळ लाटा.jpg|borderless|center|कोलंबोच्या लाटमोड्या भिंतीवर आपटणाऱ्या फेसाळ लाटा]]
{{center|'''कोलंबोच्या लाटमोड्या भिंतीवर आपटणाऱ्या फेसाळ लाटा.'''}}
{{rh|नं. १||पान ३४}}{{nop}}<noinclude></noinclude>
g61t7aul6gpoc4o3tyql0ysivauqsi9
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४५
104
111834
236032
2026-08-22T12:03:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236032
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>नांवाचा जुना मोठा बंगला आहे. हाच लंकेच्या गव्हर्नराचा राहण्याचा बंगला. मुंबई-पुण्याच्या गव्हर्नराच्या सरकारी गृहाप्रमाणे शेंकडो एकर जागेचें या बंगल्याला आवार नाहीं; सामान्यतः खासगी बंगल्याला असतें असेंच या सरकारी बंगल्याचें आवार आहे. पण त्यांत उंच उंच व दाट झाडे आहेत. यामुळे हा बंगला बाहेरून दिसत नाहीं. सरकारी बंगल्यासमोर जनरल पोस्ट ऑफिसची भव्य दगडी इमारत आहे. किल्ल्याचा राहिलेला भाग मोठमोठ्या युरोपियन दुकानांच्या, मोठमोठ्या बँकांच्या व प्रचंड हॉटेलांच्या तांबड्या, पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या दगडी व विटांच्या भव्य व उंच उंच इमारतींनीं दुतर्फा व्यापलेला आहे. कस्टम हाऊस व पॅसेंजर उतरण्याचा धक्का यांचेसमोर मोठा यॉर्कस्ट्रीट नांवाचा रस्ता आहे. त्या रस्त्यावरच ग्रँड ओरिएंटल हॉटेल व ब्रिस्टल हॉटेल या नांवांची मोठीं भव्य वसतीगृहें आहेत. गव्हर्नरच्या बंगल्यावरून जो एक मोठा प्रशस्त रस्ता जातो त्याचें नांव क्वीन्स स्ट्रीट. हे दोन्ही रस्ते समांतर असून दक्षिणोत्तर जातात. सरकारी बंगल्यासमोरून थेट पूर्वेकडे रस्ता जातो त्याचें नांव मेन स्ट्रीट. हा रस्ता पुष्कळ लांबवर जातो. या रस्त्याला दुतर्फा कोलंबोमधील युरोपीयनेतर लोकांच्या व्यापाऱ्यांचीं सारखीं दुकानें लागलेलीं आहेत. या भागाला पेट्टा म्हणतात. कोलंबोचा फोर्ट हा भाग छोटा असून त्याची फार सुबक रचना असल्यामुळे कोलंबो बंदरांत प्रथम पाऊल ठेवणाराचा फारच अनुकूल ग्रह होतो. फोर्ट व पेट्टा हे दोन्ही भाग छोटे असून ते एकमेकांना लागून आहेत. हेंच मूळचें कोलंबो शहर. पुढे शहराचा तिन्ही बाजूंस विस्तार होत गेला. त्याच्या वर्णनास लागण्यापूर्वी कोलंबो शहरांतील दळणवळणाच्या साधनांची व सोयींची माहिती देणे इष्ट आहे.<br>{{gap}}सिलोनमध्यें सर्व रेलवे रस्ते सरकारी आहेत; येथें खासगी कंपन्या व त्यांची चढाओढ हा प्रकार नाहीं. शहरांत दोन मुख्य स्टेशनें आहेत. एक '''मरडाना''' व दुसरें '''फोर्ट'''. पण कोणतेंही स्टेशन टरमीनस (शेवटचे) असे वाटत नाहीं. कारण कोलंबो शहरांतून थेट उत्तर दिशेला व थेट दक्षिण<noinclude></noinclude>
o6huk0tzomxu8hb15kzfyg23ni8pul4
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४६
104
111835
236033
2026-08-22T12:07:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236033
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोलंबो बंदर व रत्नपुर नगर|३७ }}</noinclude>दिशेला जाणाऱ्या दोन रेलवे लाइनी आहेत व दुसऱ्या ईशान्य (उत्तर- पूर्व) दिशेनें कँडीकडे जाणारी व आग्नेय (दक्षिणपूर्व) दिशेनें रत्नपुराकडे जाणारी अशा दोन लाइनी आहेत. त्या सर्व मरडाना व फोर्ट या दोन्ही स्टेशनांपासून निघतात. यामुळें प्रथमतः प्रवासी थोडासा गोंधळांत पडतो. मुंबई शहरांतून उत्तरेस जाणारी बाँबे-बडोदा लाईन, ईशान्येस नाशकाकडे जाणारी लाईन, आग्नेयीस पुण्याकडे जाणारी लाईन व चवथी थेट दक्षिणेस पेन-पनवेलकडे जाणारी लाईन (अशी लाईन नाहीं ही गोष्ट निराळी) अशा चारी लाईनी व्हिक्टोरिया व सेंट्रल या स्टेशनांपासून निघाल्या, अशी कल्पना केली म्हणजे कोलंबोच्या रेलवे रस्त्यांबद्दल चांगली समजूत पडेल. पण दक्षिण दिशेनें थेट समुद्रकिनाऱ्याला भिडून जाणाऱ्या रेल्वेच्या दोन तीन स्टेशनांखेरीज रेलवेचा उपयोग शहरांतील दळवळणाला मुळींच होत नाहीं.<br>{{gap}}दळणवळणाचें दुसरें जलद व स्वस्त साधन ट्रॅमचें. पण कोलंबोमध्यें मुंबईसारखें ट्रॅमचें फार मोठे जाळे पसरलेलें नाहीं. यॉर्क रस्त्यापासून जवळ जवळ समांतर अशा दोन ट्रॅम लाईनी एक मेन स्ट्रीटनें व दुसरी चॅथॅम स्ट्रीट ईशान्य दिशेस व आग्नेय दिशेस जातात. मेनस्ट्रीटनें जाणाऱ्या ट्रॅम लाईनला '''ग्रँड पासलाईन''' म्हणतात व ती केलानी नदीच्या व्हिक्टोरिया पुलापर्यंत जाते. दुसऱ्या ट्रॅम लाईनला '''बोरेली लाईन''' म्हणतात व ती दक्षिणोत्तर जाणाऱ्या '''वेजलाईन''' रस्त्यापर्यंत जाते. या ट्रॅमलाईनला कोठे बदली करावी लागत नाहीं; या लाईनी मध्यें कोठें एकमेकांना जोडलेल्या नाहीत; त्या एकाच ठिकाणाहून निघून परस्परविरुद्ध दिशेनें जातात. यॉर्क रस्त्यापासून दोन्ही टोकांच्या ट्रॅम टरमिनसला जाण्यास सारखेंच भाडें पडतें व तें ८ सेंट म्हणजे १६ पै पडतें व वेळ सरासरी वीस पंचवीस मिनिटें लागतो. बहुतेक शहर या दोन ट्रॅम लाईनींनीं जाऊन आलें कीं पाहून होते.<br>{{gap}}तिसरें दळणवळणाचें अर्वाचीन साधन म्हणजे टॅक्सी मोटरकार. पण हें साधन फार महागाईचें आहे. शिवाय शहराचा फारसा विस्तार नसल्यामुळें या साधनाचा फारसा उपयोग नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude>
16wtqf63wwwpkpf0kpu2q8iba1v29wj
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४७
104
111836
236034
2026-08-22T12:11:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236034
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|३८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>{{gap}}कोलंबोमध्यें घोड्याच्या गाड्या किंवा टांगे हे शहरांतील दळणवळणाचें साधन फार क्वचित् दृष्टीस पडतें.<br>{{gap}}कोलंबोमधील सररहा चालणारें साधन म्हणजे रिक्शा होत. या मनुष्यांनी ओढावयाच्या अति हलक्या व नाजुक अशा छोट्या गाड्या असतात. यांमध्यें एकच मनुष्य बसूं शकतो. अशा रिक्शा व गाडया ओढणारी माणसें येथें गल्लोगल्लीं व चौकाचौकास हवीं तितकीं दृष्टीस पडतात. ज्याप्रमाणें आपल्या इकडल्या शहरांत टांगेगाड्या उभे राहण्याचे अड्डे असतात त्याप्रमाणें कोलंबोमध्यें रिक्शा उभे राहण्याचे अड्डे असतात. मनुष्यांनीं बैलांप्रमाणें गाड्या ओढण्याची रिक्शा गाड्यांची पद्धती मी प्रथम पंचवीस वर्षांपूर्वी मद्रासेस पाहिली होती. तेव्हां ही पद्धती गुलामगिरी- इतकी मनुष्याला नीचपणा आणणारी नसली तरी या पद्धतीमध्ये आपण आपल्यासारख्या माणसांचा बैलासारखा उपयोग करून माणसांना प्रत्यक्ष बैल बनवितों म्हणून रिक्शाचा उपयोग करावयाचा नाहीं असा मी निश्चय केला होता व तदनुरूप कोलंबोंतसुद्धां मी रिक्शाचा उपयोग केव्हांही केला नाहीं. सर्व शहर मी ट्रॅमनें व पायीं चालून पाहिलें. तरी आतां शहरांतील प्रेक्षणीय स्थळवर्णनाकडे वळणें बरें.<br>{{gap}}कोलंबो शहराचे उत्तरभाग, मध्यभाग व दक्षिण भाग असे तीन भाग पडतात. मध्यभागांत फोर्ट व पेट्टा येतात. येथें युरोपीयन हॉटेलें व तद्देशीय दुकानें या खेरीज पहाण्यासारखें कांहीं नाहीं. कोलंबोचा उत्तरभाग हा लंडनच्या ईस्ट एंडसारखा साधारण गरीब स्थितींतील मजूर लोकांच्या वस्तीचा भाग आहे. बंदरही इकडेच पसरले असल्यामुळे, मालाची नेआण करणारी धक्क्यापर्यंत नेलेली आगगाडी अगदीं समुद्राला लागून असल्यामुळे व तिच्या बाजूनें पुरुषभर उंचीची भिंत सारखी घातल्यामुळे रिक्लेमेशन रोड नांवाच्या नव्या रस्त्यानें चालत गेलें म्हणजे समुद्र मुळींच दिसत नाहीं. मालाच्या नेआण करणाऱ्या बैलगाड्यांच्या रहदारी करितां हा सर्व रस्ता फरसबंदी केलेला आहे. हा भाग कांहींसा अस्वच्छ व मळकट घरांचा दिसतो. या इकडल्या भागांत मी दोनच<noinclude></noinclude>
jr1fo6w7stjcrssl7iiox87lol2qc6r
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४८
104
111837
236035
2026-08-22T12:15:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236035
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोलंबो बंदर व रत्नपुर नगर|३९ }}</noinclude>प्रेक्षणीय स्थळें पाहिली. दोन्ही ट्रॅमनें जाऊन व मग चालत जाऊन पाहतां येतात. पहिलें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे सेंट लुसीयन नांवाचें रोमन कॅथॉलिक प्रार्थना मंदिर होय. ट्रॅम टाकून प्रशस्त आरमार रस्ता चालून डाव्या हातास वळलें कीं एका बोळांत हे जुनें प्रार्थना मंदिर लागतें. बाह्य देखाव्यावरून हें फार जुनें मंदिर आहे हें तेव्हांच कळतें. कारण हे मंदिर विटांचें असून त्याला आंतून बाहेरून चुन्याचा गिलावा केलेला आहे. त्या काळवंडलेल्या व कोठें कोठें शेवाळ बाजलेल्या भिंतीवरून मंदिराचा जुनाटपणा तत्काळ ध्यानांत येतो. मंदिराचा घुमट भव्य व उंच आहे. मनोऱ्यावर रोमन कॅथॉलिक साधूंच्या मूर्ती बसविलेल्या आहेत. मी प्रार्थना मंदिराच्या आंत शिरतों तों तेथें बरीच मंडळी जमलेली असून सकाळची प्रार्थना चालू आहे असें पाहिलें. आंतला भाग भव्य व उंच आहे; अगदीं शेवटीं गाभाऱ्यावजा चौथऱ्यावर मेरी व क्राईस्ट यांची सोनेरी मखरांत बसविलेली मूर्ती आहे. या मंदिराच्या दोन्ही बाजूच्या प्रत्येक प्रचंड खांबावर लहानसा गलथा केलेला असून त्यावर निरनिराळ्या साधुसंतांच्या मूर्ती बसविलेल्या दिसल्या. प्रत्येक मूर्तीवर व तिच्यापुढे फुलांच्या माळा व गुच्छ ठेवलेले दिसले. मुख्य गाभाऱ्यासमोर व गलथ्यावर मेणबत्त्या जळत होत्या. एकंदर देखावा हिंदी देवळासारखाच दिसला, पण येथें पूर्ण शांतता होती. यामुळे प्रार्थनेला एक प्रकारचें गांभीर्य व पवित्रता आलेली दिसत होती.<br>{{gap}}दुसरें प्रेक्षणीय स्थळ म्हणजे बुद्धधर्मी '''कालिनी''' देऊळ. हे पहाण्याकरितां ट्रॅमनें व्हिक्टोरिया पुलाच्या टरमिनसपर्यंत जावें. येथेंच कालिनी नदी लागते; डाव्या हातच्या गल्लीनें गेलें म्हणजे लोखंडी खांबांनी व तुळयांनी बनविलेला मोठा थोरला पूल लागतो. नदी बरीच रुंद असून अगदीं पाण्यानें तुडुंब भरलेली आहे. अर्थात् येथें पाणी खारें आहे. कारण नदीचें महासागरास मिळालेलें मुख येथून नजीकच आहे. पूल टाकला की पलीकडे शहराचा देखावा जाऊन बागेचा देखावा सुरू होतो. जिकडे पहावें तिकडे नारळी, पोफळी, केळी, यांची झाडेंच झाडें<noinclude></noinclude>
jm4fqa8uw08jjjzxtoaytv3d1e12ydt
श्रीमद्भगवद्गीता (मूळ श्लोक, संदर्भित अन्वयार्थ आणि अर्थ यासह)
0
111838
236052
2026-08-23T02:10:53Z
~2026-45958-26
6178
नवीन पान "±"
236052
wikitext
text/x-wiki
±
8w4mqouhz10wd8jo1ha5ur85tnq9iyl
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/४९
104
111839
236055
2026-08-23T07:22:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236055
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४० |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>दिसतात; सर्व जमीन व रस्त्याच्या सभोवारची खुली जागा या सर्वावर जणूं कांहीं हिरवा हिरवा गालीचा पसरला आहे असा भास होतो. कारण सर्व जागा हिरव्यागार गवतानें व्याप्त असते. हा रस्ता कँडीला जाणारा राजरस्ता होय. मैल दीडमैल चालल्यावर उजव्या हातास कालिनी गांवाला जाणारा रस्ता लागतो. हा रस्ता नागमोडी वळणाचा आहे. दोन्ही बाजूंस लहान लहान पण नीटनेटकीं टुमदार घरें लागत होती. प्रत्येक घरासभोंवतीं नारळ पोफळ केळी यांची गर्द झाडी होती. या भागांतून गेलें म्हणजे रत्नागिरी कोकणांतील गांवाची आठवण होते. मात्र इकडलीं घरें कोकणांतील घरांपेक्षां जास्त चांगलीं दिसतात. या रस्त्यानें मी बराच चाललो तरी बुद्ध मंदिराचा मागमूस लागेना. पण इतक्यांत एक बैलाचा एक्का भेटला. जशा इकडल्या रिक्शा तशाच इकडल्या बैलाच्या गाड्या. या फारच छोट्या, हलक्या व नाजूक असतात. यांत समोरासमोर एक एकच माणूस बसण्याइतकी आकुंचित जागा असते, फार लठ्ठ माणूस असेल तर दुसरा माणूसही बसणें शक्य नाहीं इतकी जागा लहान असते. जशी गाडी तसा बैल. हा बैलही आखूडशिंगी खोंडासारखा काळ्या रंगाचा असतो. हें वहानही रिक्शाप्रमाणे मोठं नवलाचें वाटतें. या बैलगाडीवाल्याशी मंदिरास पोहोंचवून मग परत कालिनी रेलवे स्टेशनला पोहोंचविण्याचा करार करून गाडींत बसलो. भाडें ४० सेंट म्हणजे सुमारें सात आणे पडलें. या सावकाश चालणाऱ्या गाडीने गेल्यामुळे मंदिर लागतां लागेना. साधारण सायंकाळ होत आली. शेवटी एकदांचें मंदिर आलें. या मंदिराचें नवें बांधकाम चालू आहे. तें एका बुद्धधर्मी बाईनें सुरूं केलें आहे असें कळले. पण एक भाग जुनाच आहे. त्यांत बुद्धाची निजलेल्या स्थितींतील एक प्रचंड मूर्ती आहे. दुसरी एक बसकी मूर्ती आहे; भिंतीवर अंजिठा लेण्याप्रमाणें रंगीत चित्रे काढलेली आहेत. पण काळोख होत चालल्यामुळे येथला देखावा स्पष्टपणे दिसला नाहीं. प्रवासाकरितां घेतलेली टॉर्च आणली असती तर बरें झालें असतें असें वाटलें. देवालयाजवळ बुद्धाचा कांहीं तरी अवशेष ठेवलेला दागबा<noinclude></noinclude>
hxcbj25noqhp5m6hvlym12nbhod4xg4
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५०
104
111840
236056
2026-08-23T07:31:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236056
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोलंबो बंदर व रत्नपुर नगर|४१ }}</noinclude>(स्तूप) होता. याचा आकार व रचना अगदीं ठरलेली असते. हे सर्व देऊळ व दागबा विटांचें व त्यावर केलेल्या गिलाव्याचें काम आहे. समोरच पण बरीच खोलांत अशी कालिनी नदी आहे. पण बाजूच्या गर्द झाडांनीं ती दिसत नाहीं. जरी या देवळाचें ठिकाण निसर्गरमणीय आहे तरी या बुद्धदेवळापेक्षां मला '''मलीकगुंडा''' नांवाचें पेट्टाभागाच्या पलीकडे असलेले देऊळ जास्त आवडलें. या देवळाच्या मुख्य उपाध्यायाला मी प्रो. धर्मानंद कौशांबीकडून पत्र घेतलें होतें. पण त्यांना इंग्रजी येत नसल्यामुळे मोठी अडचण भासली. दुसऱ्या एका भिक्षूला थोडेसें बोलण्यापुरतें इंग्रजी येत होते. येथे सुमारें पांचशे भिक्षूंना राहण्याची व शिकण्याची व्यवस्था आहे. हे देऊळ व त्याचें आवार नीटनेटकें व स्वच्छ ठेवलेले दिसलें; तितकें कालिनी देवळाचें दिसलें नाहीं. कोलंबोंत लहान मोठीं बुद्धधर्मी देवळें आणखी बरीच आहेत.<br>{{gap}}पण कोलंबोमध्यें- अत्यंत विलायती बनलेल्या शहरांत सुद्धां- देवळाखेरीज बुद्ध धर्माच्या प्रसाराची व प्राबल्याची खूण म्हणजे चौकाचौकाला दिसणारीं पिंपळाचीं झाडे होत. बुद्धगयेस पिंपळाच्या झाडाखाली गौतमबुद्धाला ज्ञान झालें; व म्हणून हा वृक्ष बौद्ध धर्मीयांना पवित्र वाटतो. पिंपळाला लहान मोठा पार बांधतात व झाडाला लागून लहानशा लाकडी मखरांत बुद्धाची मूर्ति ठेवतात. तिच्या पुढें प्रार्थना करतांना व मूर्तीच्या पुढें तांबड्या व पांढरा चाफ्याची फुलें व इतर फुले ठेवतांना बुद्ध बायका पुरुष या चौकांशी नेहमीं दिसतात. या पिंपळाच्या पारांप्रमाणें आपलेपणाचा भास उत्पन्न करणारीं तामीळ लोकांनी बांधलेलीं हिंदू देवळेंहीं कोलंबोमध्ये आहेत. त्यापैकीं एक देऊळ तर बांधकला व मूर्तिकला या दृष्टीने फार प्रेक्षणीय आहे हें छायाचित्रावरून दिसून येईल.<br>{{gap}}कोलंबोच्या दक्षिणेकडे बेटांतील सैन्याच्या बराकी, सेक्रेटॅरिएट व कौंसिल हॉल वगैरे सरकारी इमारती आहेत. आधीं बंदराला व धक्याला लागून दक्षिण अंगास जो उंचवट्याचा व पुढें घुसलेला भाग आहे तेथें<noinclude></noinclude>
83sesh97wh9f66nbg2yr7dkzegmkvpm
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५१
104
111841
236057
2026-08-23T07:35:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236057
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>कोलंबो बंदराचीं लष्करी संरक्षक कामे आहेत; तोफांचा डेपो येथेंच आहे. समुद्राच्या काठानें रस्ता आहे. तो अर्धवर्तुळाकार असून बंदराचे बाजूस येतो. डाव्या हातास गॉर्डन बाग नांवाची छोटीशी टुमदार बाग लागते. मागें सांगितल्याप्रमाणें या बागेला लागून क्वीन्स हाऊस नांवाचा गव्हर्नराचा बंगला आहे. त्या बंगल्यावरून क्वीन्सस्ट्रीट नांवाचा रस्ता थेट दक्षिण दिशेला जातो. या रस्त्याच्या मधोमध कोलंबोचा घड्याळ बुरूज आहे व त्याचेवरच गलबतांना व आगबोटींना मार्गदर्शक व स्थान दर्शक फिरता मोठा दिवा बसविलेला आहे. अर्थात् घड्याळ-बुरूज व दीपगृह हीं कोलंबोस एकच आहेत. मुंबईतील कुलाब्याची दांडी हे दीपगृह शहरापासून फार दूर व भरतीच्या वेळी पाण्यानें वेष्टिलें जाणारें दीपगृह आहे. पण कोलंबोचें दीपगृह हे शहरांतील एक प्रेक्षणीय स्थान असून तें प्रशस्त व सुंदर रस्त्याचे मधोमध बांधलेलें आहे. दीपगृह टाकून सरळ पुढे गेलें कीं उजव्या हातास गोलंदाज सैन्याच्या तुकडीच्या बराकी तर डाव्या हातास लष्करी शिपायांच्या बराकी लागतात. या बराकी टाकल्या की अफाट हिंदी महासागर समोरच दृष्टीस पडतो व आश्चर्य व आनंद अस मिश्र मनोविकार मनुष्याच्या मनांत उद्भूत होतात. येथून तब्बल एक मैलाची समुद्राला लागून सहलवाट बांधलेली आहे. ही वाट सन १८५४ मध्यें '''वार्ड''' नांवाच्या गव्हर्नरनें बांधविली. या सहलवाटेच्या डाव्या अंगास व समुद्रापर्यंत पसरलेल्या लांब रुंद कालव्यावजा सरोवराच्या कांठीं सिलोन सरकारची सेक्रेटॅरिएटची इमारत आहे. ही इमारत तांबडसर दगडाची असून फार लांबट आहे. चालतीं तीनशें पावलें लांबी भरली. या इमारतीपासून वेगळी, पण दगडी दुमजली आणि पायवाटेनें जोडलेली अशी, कौन्सिल स्टेट हॉलची भव्य इमारत आहे. या हॉलचा दर्शनी भाग समुद्रासमोर असून त्याला लांब, रुंद व दगडी कठड्यानें सुशोभित केलेल्या दगडी पायऱ्या आहेत. त्या दुसऱ्या मजल्याच्या हॉलवर जातात. या पायऱ्यांचे खाली पोर्चसारखा मोटारी व गाड्या थांबण्यास कमानदार खुला रस्ता ठेवला आहे. या तळमजल्यावर सभा-<noinclude></noinclude>
cjgnud7mfho3hvrrwsh4wxjq128pibv
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५२
104
111842
236058
2026-08-23T07:37:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236058
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|'''पेट्टामधील हिंदु देवालय, कोलंबो.'''}}
{{rh|नं. २||पान ४१}}
{{nop}}<noinclude></noinclude>
t0a273zjvgcc2m35hu21m62s0ulnvg2
236069
236058
2026-08-23T08:43:03Z
कल्पनाशक्ती
3813
236069
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 52 पेट्टामधील हिंदु देवालय कोलंबो.jpg|center|borderless|पेट्टामधील हिंदु देवालय कोलंबो]]
{{center|'''पेट्टामधील हिंदु देवालय, कोलंबो.'''}}
{{rh|नं. २||पान ४१}}
{{nop}}<noinclude></noinclude>
86agh26fvre7f01unejhpw3o6udlo1e
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५३
104
111843
236060
2026-08-23T07:42:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236060
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोलंबो बंदर व रत्नपुर नगर|}}</noinclude>सद व प्रेक्षक यांच्या उपयोगाचा वाटपाही दिवाणखाना आहे. तेथून विजेच्या पाळण्याने प्रेक्षकांच्या सज्जाकडे जातां येतें. कौन्सिल हॉलची रचना अर्धवर्तुळाकार असून सभोवार निरनिराळ्या दर्जाच्या प्रेक्षकांकरितां सज्जे आहेत. कौन्सिलची बसावयाची रचना मुंबई कौन्सिलप्रमाणें आहे. जेथें जेथें इंग्रजांचें राज्य आहे तेथें तेथें त्यांनी लोकसभांची सर्व रचना व व्यवस्था ब्रिटिश पार्लमेंटासारखीच सामान्यतः केलेली आहे. यामुळें कोठेंही पहावयास गेलें तरी एक प्रकारचा पूर्वपरिचयाचा भास होतो. सिलोनच्या कौन्सिलची बैठक चालूं असल्यामुळे एके दिवशीं दोन प्रहरीं (येथें अडीच वाजतां बैठक सुरू होते) कौन्सिलचें काम पहावयास गेलों होतों. काम चालविण्याची पद्धत व वादविवादाची पद्धत मला पूर्ण परिचयाची वाटली. कारण मी मुंबई कौन्सिल, दिल्लीची असेंब्ली व ब्रिटिश पार्लमेंट यांच्या बैठका एक एकदां तरी पाहिलेल्या होत्या.<br>{{gap}}ही एक मैलाची सहलवाट खरोखरीच अपूर्व आहे. डाव्या बाजूस तो हिरवट निळसर रंगाचा अफाट हिंदी महासागर व त्याच्या त्या पांढऱ्या फेसाच्या पुष्पहारांनीं युक्त अशा लाटा, ती केशरी रंगाच्या बारीक रेतीने शोभित केलेली वाळवंटाची पट्टी, तिला लागून तो दगडी धक्का व डामरी काळी सहलवाट, तिच्या पलीकडे तांबड्या बारीक खडीचा रस्ता व त्याचे पलीकडे तें लांब व रुंद हिरव्यागार हरळीनें आच्छादिलेलें खुलें मैदान हा देखावा एकसमयावच्छेदेंकरून पाहिला म्हणजे ही सहलवाट कोलंबोचा एक अपूर्व अलंकार होय असें वाटल्यावांचून रहात नाहीं. या सर्व भागावर कोठेही एक सुद्धां झाड नाहीं. सर्व भूमिभाग अगदीं खुला व मोकळा ठेवण्यांत आला आहे. यामुळे सकाळी संध्याकाळीं केव्हांही येथें सहल करावयास आल्याबरोबर मन प्रसन्न होतें असा माझा आठदहा दिवसांचा अनुभव मला सांगतो. या खुल्या भागांत शुभ्र दगडांनी बांधलेला एक उंचच उंच स्तंभ आहे. हा अर्थात् महायुद्धाचा स्मारक स्तंभ आहे व तो फार दूरवरून स्पष्टपणे दिसतो. स्तंभाचें शिल्पकाम साधेंच पण नीटस आहे म्हणून हा स्तंभ सुंदर दिसतो. एका मैलाची ही<noinclude></noinclude>
9z5f7r1ct6ubcwzw84xne1hqwoknh78
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५४
104
111844
236061
2026-08-23T07:46:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236061
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>सहलबाट जेथें संपते तेथें गॉलफेस हॉटेल नांवाचें तांबड्या विटांचें तीन मजली भव्य निवासस्थान आहे. हें निवासस्थान उत्तराभिमुख असल्यामुळे सहलवाटेच्या अगदीं समोर येतें. याच्या बागेची भिंत सहलवाटेच्या धक्याला लागूनच आहे. अर्थात् सहलवाट या हॉटेलाशीं खुंटते व मग रस्ता हॉटेलावरून समोर पूर्वेकडे जातो व दक्षिण दिशेच्या गॉल नांवाच्या बंदराला जाणाऱ्या मोठ्या राजरस्त्याला जाऊन मिळतो. ही सहलवाट कोलंबोत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचें मन आकर्षण करणारी आहे; माझ्यासारख्या रोज चालण्याचा व्यायाम करणाऱ्याला इतकी उत्तम व हवाशीर दुसरी पायवाट कोलंबोमध्यें नाहीं.<br>{{gap}}परंतु कोलंबोमधील यापेक्षांही अधिक प्रेक्षणीय स्थान म्हणजे '''सिनॅमन गार्डन्स''' (दालचिनी बाग) हा विस्तीर्ण व हवाशीर भाग होय. या भागाला हें नांव पडण्याचें कारण असें कीं डच लोकांच्या ताब्यांत कोलंबो असतांना या ठिकाणी त्यांनीं दालचिनीच्या बागा बनविल्या होत्या व हा मसाल्याचा पदार्थ ते मोठ्या किफायतीनें युरोपांत नेऊन विकत असत. सध्या अर्थात् या भागांत एकही दालचिनीची बाग नाहीं. आतां हें मुंबईतील मलबार हिल किंवा कुलाबा याप्रमाणे श्रीमंत लोकांच्या राहणीचें ठिकाण झाले आहे.<br>{{gap}}हें ठिकाण बरेंच विस्तीर्ण आहे. त्याचे मधोमध व्हिक्टोरिया पार्क नांवाची मोठी वर्तुळाकार बाग व उपवन ठेविलें आहे. त्याचे सभोवार वर्तुळाकार सहलवाट केलेली आहे. व्हिक्टोरिया पार्कचे दाट बाग व खुलें उपवन असे दोन भाग आहेत. खुल्या उपवनांत जिकडे तिकडे हिरवींगार हरळीचीं पटांगणें राखिलीं आहेत व मधून मधून फरसबंदी पाऊलवाटा ठेवल्या आहेत व हारीनें विजेच्या दिव्यांचे खांब बसविलेले आहेत. या उपवनाच्या एका टोकाला नवीन पांढऱ्या रंगाची दगडी व काँक्रीटची मिश्र बांधणीची उत्तम इमारत दिसते. ती ग्रीक बांधकला पद्धतीची आहे. प्रवेशद्वारासमोर सहा उंचच उंच खांब आहेत व त्यांवर तिकोनी दगडी छपर आहे. ही इमारत सन १९२८ मध्ये पुरी झाली<noinclude></noinclude>
t5dmo8h6a72w6qbx6swzs9bkqmmnc54
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५५
104
111845
236062
2026-08-23T07:51:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236062
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोलंबो बंदर व रत्नपुर नगर|४५ }}</noinclude>असें प्रवेशद्वारावरील शिलालेखावरून कळलें. हिला टाऊन हॉल म्हणतात. पण ही कोलंबो म्युनिसिपालिटीच्या कचेरीची व कमिटीच्या बैठकीची इमारत होय. इमारत प्रेक्षणीय आहे यांत शंका नाहीं. सभोवार हिरवळीनें हिरवीगार दिसणारी खुली पुष्कळच जागा असल्यानें इमारत मोठी उठावांत दिसते व पांढऱ्या व हिरव्या रंगाचा तो मिलाफ मोठा मनोहर वाटतो.<br>{{gap}}या खुल्या उपवनाच्या दुसऱ्या टोकास कोलंबोचें पदार्थसंग्रहालय व त्याला लागून रॉयल एशिआटिक सोसायटीच्या सिलोन ब्रँचचें पुस्तकालय आहे. म्हणजे येथें छोट्या प्रमाणावर ब्रिटिश म्युझियम सारखी व्यवस्था आहे. शिवाय पार्कच्या बाहेरच्या रस्त्याला लागून कोलंबोचें सार्वजनिक वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आहे. पार्कच्या बागेच्या बाजूस चित्रमूर्तिकलाकृतींचें संग्रहालय आहे. या विस्तीर्ण उपवनाचे जरा दक्षिणेस गेलें म्हणजे हिरवेंगार मोठें मैदान लागतें. त्यांत युनिव्हर्सिटी कॉलेज, रॉयल ट्रेनिंग कॉलेज इत्यादि शिक्षणसंस्था एकमेकाशेजारी आहेत. चौकशीअंतीं असें कळलें कीं सिलोनमध्यें अजून स्वतंत्र विश्वविद्यालय स्थापन झालेलें नाहीं. फक्त एकच युनिव्हर्सिटी कॉलेज तेवढे बी. ए. पर्यंत शिकविणारे असून तें लंडन युनिव्हर्सिटीला जोडलेलें आहे. यामुळें सर्व परीक्षा लंडन युनिव्हर्सिटीकडून होतात. मुलांना परीक्षेला बसण्याची फी बरीच जबर आहे. नुसत्या प्रवेश परीक्षेस साठ रुपये फी आहे व पुढच्या परीक्षांस तर सवाशेपासून दीडशे रुपये परीक्षेची फी आहे. याप्रमाणें सिनामन गार्डन भाग म्हणजे कोलंबोच्या सार्वजनिक संस्थांचा भाग आहे. बागेच्या बाकी राहिलेल्या भागांत मोठमोठे बंगले आहेत. मी हा भाग दोनदां पायीं चालून जाऊन पाहिला. पदार्थ संग्रहालय व चित्रकलागृह हे आणखी एका दिवशीं पाहिलें.<br>{{gap}}या भागाला जावयाचा सोयीचा व सुंदर रस्ता म्हणजे फोर्ट स्टेशनपासून समुद्रकाठानें दक्षिण दिशेला जाणाऱ्या रेल्वेनें कोलपिटीया या स्टेशनला जावयाचें; मध्यें '''स्लेव्ह आयलंड''' नांवाचें एकच स्टेशन लागतें. '''कोलपि'''-<noinclude></noinclude>
164q6ovmv42g3w6t7na804tgrvsfzw0
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५६
104
111846
236063
2026-08-23T07:59:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236063
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>'''टीया''' स्टेशनवरून पूर्वेस '''ग्रीनपाथ''' नांवाचा रस्ता जातो तो थेट व्हिक्टोरिया बागेच्या व उपवनाच्या मधून जातो. किती सुंदर हा रस्ता आहे! रस्ता डांबरी, निर्धूळ व निर्मळ असून त्याचे दोन्ही बाजूंस क्राँक्रीटचे पायरस्ते आहेत; नवीं झाडें पायरस्त्याच्या मधून लावलीं आहेत. पण येथें रस्त्याला झाडें लावण्याची जरूरींच नाहीं. कारण रस्त्याच्या दुतर्फा बंगलेच बंगले आहेत व प्रत्येक बंगल्याच्या पुढे फुलबाग असून नारळ, पोफळ, केळी व इतर नानारंगी फुलांनी फुललेले वृक्ष हारीनें लावले आहेत. यामुळे हा रस्ता आपोआप मुद्दाम दुतर्फा लावलेल्या गर्दच्छाय वृक्षांनी अलंकृत केलेल्या रस्त्याप्रमाणें (ॲव्हन्युप्रमाणें) दिसतो. प्रत्येक बंगल्याला खुजी भिंत असते. तिच्या मागे तांबड्या, पिवळ्या, हिरव्या अशा क्रोटन जातीच्या झुडुपांचे कुंपण किंवा रांग लावलेली असते, व त्याचे मागें मोठ्या वृक्षांची रांग असते. कांहीं बंगल्यांच्या भिंतीवर वेली चढविलेल्या असतात व त्या वेलींच्या पानांनीं भिंत अजीबात बुजून गेलेली असते. यामुळे त्या ठिकाणी भिंतीचें कुंपण आहे कां दाट वेलिचें कुंपण आहे हें ओळखण्याची भ्रांति पडते. बंगले बहुतेक विटांच्या बांधणीचे असून बाहेरून बंगल्यांना गिलावा केलेला असून त्याला पिवळसर, केशरी, गुलाबी व बदामी असे नाना तऱ्हेचे नयनमनोहर रंग दिलेले असतात. तेव्हां या ग्रीनपाथनें जातांना कोलंबोच्या या भागाच्या सौंदर्यानें मन थक्क होऊन जातें यांत शंका नाहीं.<br>{{gap}}या ग्रीनपाथने व्हिक्टोरिया पार्कच्या मधोमध मनुष्य येतो. डाव्या हातास बागेचें लोखंडी फाटक लागतें. व्हिक्टोरिया बागेची रचना मनोहर आहे. त्या बागेंत नानातऱ्हेचे पामवृक्ष आहेत; गर्द छायेचे मोठमोठे वृक्ष आहेत; कांहीं वृक्षांवर वेली चढविलेल्या आहेत; एक वर्तुळाकार फुलबाग केली आहे व तिच्या सभोवारच्या पायरस्त्यावर मधून मधून ताटीच्या कमानी करून त्यावर फुलवेली चढविलेल्या आहेत; कांहीं ठिकाणी पोफळीप्रमाणे सडपातळ वाढणाऱ्या पाम झाडांची दुहेरी रांग इतकी दाट लाविली आहे की पायवाट म्हणजे जणू कांहीं अरूंद पण उंच असा पाचूच्या रंगाचा एक बोगदा आहे असा भास होतो! या बागेंत बँड स्टँड<noinclude></noinclude>
rzql23vm319jh0hqrcwanbln3lac4r4
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५७
104
111847
236064
2026-08-23T08:03:59Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236064
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोलंबो बंदर व रत्नपुर नगर|४७ }}</noinclude>आहेच व मी सायंकाळी गेल्यामुळें तेथें बँडवादन थोडा वेळ चालू होतें. तास दोन तास मनाची करमणूक करणारी व निसर्ग-देवीच्या निकट सहवासाचा आनंद देणारी ही बाग आहे यांत शंका नाहीं.<br>{{gap}}कोलंबोंतील विलासप्रिय लोक शनिवारी आदितवारीं ज्या सौंदर्यस्थळीं वनभोजनास जातात त्या स्थळाचें वर्णन करून हें कोलंबो पुराण पुरें करणें प्राप्त आहे. या सौंदर्य स्थळाला '''माँट लॅव्हिनीया''' म्हणतात. हें शहरापासून सुमारें सात आठ मैल आहे. याला आगगाडीने किंवा मोटारनें जातां येतें. आम्हीं जातांना मोटारबसने गेलों व येतांना आगगाडीनें आलों. मोटारबस फोर्ट स्टेशनच्या अलीकडील गॉल रस्त्यावरील अड्ड्यावरून निघते. हा गॉल रस्ता सारखा सत्तर मैल गॉल बंदरापर्यंत गेला आहे. हा मोठा प्रशस्त व सुंदर रस्ता आहे. माँट लॅव्हिनीयापर्यंत सारखा सरळ एका सुतांत हा रस्ता गेला आहे; दोन्ही बाजूंस फरसबंदी प्रशस्त पायवाटा आहेत; दुतर्फा लहान लहान टुमदार बंगले व मधून मधून दुकानें आहेत. आपल्या डाव्या बाजूस हिंदी महासागर सारखा दिसत राहतो. त्याचे कडेस मधून मधून पण तुरळक व पातळ लावलेलीं नारळीची झाडें दिसतात; जवळून आगगाडीचा रस्ता जातो; पण त्याचे दोन्ही बाजूंस भिंती वगैरे किंवा मोठें उंच कांपाऊंड नसल्यामुळे या आगगाडीच्या रस्त्यांनें समुद्राचा देखावा आडला जात नाहीं. त्याचे अलीकडे बंगल्यांच्या गल्ल्या व त्यांचे तांबडे रस्ते लागतात; अशा तऱ्हेचा मोठ्या मजेदार रचनेचा हा भाग आहे. जरी '''वेलावाटा''' स्टेशनपर्यंतच म्युनिसिपालिटीची हद्द आहे तरी आतां पुढें सुद्धां सारखे बंगले व दुकानेंच लागतात. कालें करून कोलंबोची हद्द माँट लॉव्हिनीयापर्यंत जाईल असें वाटतें. माँट लॅव्हिनीयाच्या जरा अलीकडे आलें म्हणजे मात्र शहर टाकून आपण खेडेगांवासारख्या भागाला आलों असा भास होतो. माँट लॅव्हिनीयाच्या अड्ड्याशीं आम्ही उतरलों. पण त्या दिवश दोन प्रहरपासून झिम झिम पावसाची पिर पिर चालू होती. म्हणून आम्ही माँट लॅव्हिनीयाशी जाण्याकरितां बैलाचा एक्का केला व लवकरच माँट<noinclude></noinclude>
iz36rppgb8h7qt43xctxt2w2n1kywg5
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५८
104
111848
236065
2026-08-23T08:13:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236065
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|४८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>लॅव्हिनीया येथील हॉटेलच्या आवारांत गेलों. ज्याला मोठें '''माँट लव्हिनीया''' असें नांव दिलें आहे, तें ठिकाण म्हणजे जराशा उंचवट्याचें समुद्रांत घुसलेलें खडकाचें टोंक होय. त्याला टेकडी म्हणणें म्हणजे सुद्धां त्या स्थानाची थट्टा करणे आहे. पण त्याला माँट (डोंगर) असें भपकेदार नांव दिले आहे. त्यामुळे पहिल्यानें मनुष्याची फसगत होते. रेल्वे स्टेशनाकरितां जरा उंचवट्याच्या दोन्ही बाजू खोडून खोलगट रस्ता केला आहे. त्यावर छोटा पूल असून समुद्रांत घुसलेल्या भागावर टोलेजंग उंच जोत्याचें तांबड्या विटांचं हॉटेल आहे. या हॉटेलचा हॉल मात्र फार प्रशस्त, लांबरुंद, गुळगुळीत व तजेलदार लाकडी तक्तपोशीचा आहे. भिंतींना पांढरा शुभ्र रंग दिलेला आहे. हा भाग समुद्रांत घुसलेला असल्यामुळे हॉलच्या तिन्ही बाजूंनी समुद्राची मजेदार शोभा दिसते. असें हे निसर्ग- रमणीय ठिकाण असल्यामुळे शनिवारीं रविवारी युरोपियन युवायुवती येथें सहल करण्यास, येथल्या जलमंदिरामध्ये पोहण्यास व जलविहार करण्यास व रात्रीं नाच गायनाचे जलसे करण्यास येतात, येथें अर्धा- अधिक दिवस राहतात व हॉटेलांत मर्जीप्रमाणें व पैशाच्या पिशवीच्या लांबीप्रमाणे फराळ चहा जेवण उरकतात. मात्र या निसर्गरमणीय देखाव्याचें भाडें धरून की काय येथें नुसत्या चहा केकला १ रुपया पडतो. त्या दिवशी पाऊस असल्यामुळे सुंदर केशरीरंगी वाळवंटावर आम्हांस सहल करावयास सांपडलें नाहीं. पण त्या मन प्रसन्न करणाऱ्या सुंदर दिवाणखान्यांत एक रुपयाचा चहा केक पिऊन व खाऊन व कांहीं वेळ तेथल्या मनोहर देखाव्याचा आस्वाद घेऊन आम्ही नजीक असलेल्या स्टेशनवर येऊन आगगाडीनें परत बिऱ्हाडी आलों.<br>{{gap}}'''कोलंबो''' शहर नीटनेटकें, स्वच्छ व हवाशीर आहे यांत शंका नाहीं. पण येथे दोन प्रहरीं पुष्कळ उष्मा भासतो असा मला अनुभव आला. मात्र रात्री व सकाळी नेहेमीं थंड व गार हवा असते हें खरें.<br>{{gap}}मी ज्या बोटीनें आलों त्याच बोटींत मुंबई येथील '''एग्युमिक्श्चर''' व '''इंडोबाम''' नांवाच्या तयार औषधांचे कारखानदार रा. कर्णिक हे गृहस्थ<noinclude></noinclude>
8m0ji0aoh1citjpysk3h8ze2u0vrbzd
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/५९
104
111849
236066
2026-08-23T08:15:41Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236066
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
{{center|'''मौंट लॅव्हिनिया - पोहणाऱ्या स्त्रिया.'''}}
{{rh|नं. ३||पान ४८}}
{{nop}}<noinclude></noinclude>
2vieveqr9z86msd9lz0bw6godr6emi6
236070
236066
2026-08-23T08:43:41Z
कल्पनाशक्ती
3813
236070
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br>
[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 59 मौंट लॅव्हिनिया पोहणाऱ्या स्त्रिया.jpg|borderless|center|मौंट लॅव्हिनिया पोहणाऱ्या स्त्रिया]]
{{center|'''मौंट लॅव्हिनिया - पोहणाऱ्या स्त्रिया.'''}}
{{rh|नं. ३||पान ४८}}
{{nop}}<noinclude></noinclude>
8v5zvgws0c557ui3sjeablksugvxvta
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६०
104
111850
236067
2026-08-23T08:23:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236067
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कोलंबो बंदर व रत्नपुर नगर|४९ }}</noinclude>होते. यामुळे बोटीवर आल्यापासून त्यांचा माझा स्नेह जमला. कोलंबोमध्यें आम्हीं डोमिनीयन हॉटेलमध्ये समोरासमोरच्या खोल्यांत रहात होतों. कर्णिक हे अर्थात् आपल्या औषधांचा खप वाढविण्याच्या बुद्धीनें व पूर्वीच्या व्यवहाराची वासलात लावण्याकरितां सिलोनला आले होते. रत्नपुर या गांवी पूर्वी त्यांची औषधें खपविणारे दक्षिणी गृहस्थ बाजीराव म्हणून होते. ते वारले होते. पण त्यांच्या कुटुंबाला भेटण्याकरितां त्यांना रत्नपुरास जावयाचें होतें. तेव्हां एका दिवशीं सकाळीं आम्हीं आगगाडीनें रत्नपुरास गेलों व मोटार बसनें सायंकाळी परत आलों. कोलंबोपासून रत्नपूर आगगाडीनें ६४ मैल व मोटार रस्त्यानें ५६ मैल आहे. आगगाडी '''आवीसवेला''' या सदतीस मैलांवर असलेल्या जंक्शन स्टेशनपर्यंत थेट पूर्वेस जाते व तेथून मग दक्षिणेस वळते. '''आवीसवेला''' स्टेशनपर्यंत साधारण सपाटीच आहे. खोलगट जागेंत भाताचें पीक व उंचवट्याच्या जागेंत व डोंगरांवर रबराची झाडें असा सारखा देखावा दिसतो. नारळ, पोफळ व केळीं हीं तर लंकेंत सर्वत्र होतात, त्यामुळें हीं झाडें घरोघर व खेडोखेडी दिसतात. पण या प्रांताची मौज ही कीं येथें इंचभर ही जागा उजाड, ओसाड किंवा नापीक दिसत नाहीं. सर्व भूमिभाग हिरवागार असून जिकडे तिकडे धान्यपिके किंवा फळपिके किंवा पेयपिके दृष्टीस पडतात. '''आवीसवेला''' स्टेशनपासून सपाट व खुला मुलुख जाऊन डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा मुलूख लागतो. डावे बाजूस प्रचंड पर्वतप्राय टेकड्या व डोंगर लागतात. पण सर्व डोंगर उपयुक्त झाडांनी लागवडीस आणलेले आहेत. घनघोर अरण्याच्या खोऱ्यात शिरल्याचा भास येथपासून '''रत्नपुराला''' पोहोंचेपर्यंत होतो. आपण पर्वतांच्या रांगांच्या चिळणींत शिरत आहों असें वाटतें तोंच '''रत्नपुर''' गांव येतें. हा गांव बराच मोठा आहे. राजरस्ता थेट बाजार पेठेतून जातो; सुमारें एक मैल ही बाजार पेठ असावी. या गांवच्या चारी बाजूंस घनदाट रानानें- नव्हे दाट रबराच्या झाडांनी किर्र झालेले डोंगर दिसतात. यामुळे डोंगररूपी तटांनीं संरक्षिलेल्या किल्ल्याप्रमाणें हें गांव दिसतें.<noinclude></noinclude>
d1dkpz859dw3yhmix4cl0grfe5nfo90
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६१
104
111851
236068
2026-08-23T08:27:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236068
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५०|लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>रा. कर्णिक यांनी बाजीरावांच्या कुटुंबाचा शोध केला व शहराच्या शेवटीं एका मळ्यांतील खोपटांत ती बाई व तिचीं मुलें राहतात असें कळलें. तेव्हां आम्ही तिकडे गेलों. रत्नपूर शहर '''कालूगंगा''' नांवाचे नदीचे कांठीं आहे. शहर टाकल्यावर उंच लोखंडी पूल लागला. नदीचे पात्र खोल असून ती संथपणे वहात होती. कालूगंगा नांवाप्रमाणें नदीचे पाणी धूसर काळसर होतें. येथला देखावा भव्य व भीतिप्रद भासला हें कबूल केलें पाहिजे. पूल टाकल्यावर एका भिकार झोपडीशी आम्ही आलों. येथें ती बाई राहते असें बरोबर आलेल्या पोऱ्याने सांगितलें. रा. कार्णिकांनी मराठींत त्या बाईस हटकलें व मराठी शब्द ऐकल्याबरोबर त्या बाईनें कर्णिकास ताबडतोब ओळखले. 'आययो' असा आश्चर्यचकित आवाज काढून त्या बाईनें रा. कर्णिकांचें स्वागत केलें. बाजीराव हे ब्राह्मण गृहस्थ विष्णुपंत छत्र्यांच्या सरकशींत होते. ती सरकस सिलोनला येऊन रत्नपुरास आली असतां बाजीराव येथेंच राहिले. त्यांचें कुटुंब म्हणजे कोल्हापुरकडील एक बाई होती. येथें राहून ते ज्योतिष सांगणें, आयुर्वेदिक औषधे विकणें इत्यादि हरहुन्नर करून राहत असत. हा भाग हिवतापकर असल्यामुळे बाजीराव कर्णिकांचे हिवतापावरील औषध पुष्कळ खपवीत. म्हणून कर्णिक या गांवाला आले. अर्थात् बाजीरावाच्या पश्चात् त्यांचें दुकान बंद झालें होतें नव्हतें तें मोडून त्या बाईनें आपला व मुलांचा कसातरी संभाळ केला. तिच्या हल्लींच्या स्वरूपावरून व राहणीवरून तिची हलाखीची स्थिति झाली आहे हें पाहून कर्णिकांना त्या बाईची करुणा आली व त्यांनीं दोन तीन रुपयांच्या नोटी बाईस दिल्या. मग आम्ही बाजीरावाच्या धाडशी स्वभावाबद्दल कौतुक करीत परत फिरलों. रत्नपूर हें गांव रत्नाकरितां प्रसिद्ध आहे. हीं रत्ने डोंगराच्या खबदडांत खोल खणल्यावर सांपडतात; पण माहीतगार माणसाखेरीज तीं ओळखतां येत नाहींत. अर्थात् आम्हांला डोंगरांत जाऊन रत्ने काढण्याची पद्धति पहाणें शक्य नव्हतें व वेळही नव्हता. म्हणून ऐकीव माहितीवर समाधान मानून आम्ही बसनें परत आलों. रत्नपूर हे लंकेंतील पावसाचें मोठें आगर आहे. येथें सर्वांत जास्त म्हणजे १५० इंच दरवर्षी पाऊस पडतो असें कळलें.<br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
fggieebmxv68pax3hb94pm0pg83q25g
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६२
104
111852
236071
2026-08-23T08:44:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण ४ थें. कँडी व पेरेडॅनिया. मुंबई इलाख्याच्या मुंबईप्रमाणें लंका बेटाचें कोलंबो हैं समुद्र किना- यावर व समुद्र सपाटीवर असलेलें मोठें बंदर, व्यापाराचें मुख्य केन्द्..."
236071
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
प्रकरण ४ थें.
कँडी व पेरेडॅनिया.
मुंबई इलाख्याच्या मुंबईप्रमाणें लंका बेटाचें कोलंबो हैं समुद्र किना- यावर व समुद्र सपाटीवर असलेलें मोठें बंदर, व्यापाराचें मुख्य केन्द्र व नव्या ब्रिटिश राजवटीचें राजधानीचें, शहर आहे; तर पुण्याप्रमाणें कँडी हैं जुन्या राजवटींचें राजधानीचें, समुद्र सपाटीपासून सुमारें सोळाशे सतराशें फूट उंचीवर असलेलें व डोंगरटेंकड्यांनी तटबंदी केलेले शहर आहे. कोलंबोपासून कँडीला रेलवेनें किंवा मोटारवसनें जातां येतें. मी ता. ५ द्विजंबर १९३३ रोजी दुपारच्या दोन वाजतांच्या - गाडीनें फॅडीस जाण्यास निघालों. कोलंबोपासून कँडी ७४ मैल आहे. सेकंड क्लासचें भार्डे सुमारें साडेतीन रुपये पडले. कोलंबोपासून पोलग- हवेला नांवाच्या पंचेचाळीस मैलांवर असलेल्या स्टेशनपर्यंत साधारण सपाटीच्याच भागांतून आगगाडी जाते. कारण पोलगहवेला समुद्र- सपाटीपासून अवघ्या २४० फूट उंचीवर आहे. हा भूमिभाग पाणथळ जमिनीचा आहे. वाटोवाट तलावासारखा पाण्यानें तुडुंब भरलेला भूमिभाग लागत होता. या सखल जागेत अर्थात् भातांचीं पिके लावलेलीं होतीं; उंचवढ्याच्या जागांवर, टेकड्यांवर व डोंगराळ भागांवर नारळी, पोफळी, केळी (लंका बेटांतील सर्वगामी पिकें) व मधून मधून रबराच्या उंच उच झाडांच्या रायाच राया लागत होत्या. तुरळक चहाचीं झुडपेंही दृष्टीस पडत होती. पण लंकेच्या हवापाण्याची व पावसाच्या मुबल- कतेची मौज ही कीं येथली एक इंचभर जागाही नापीक नव्हती. जिकडे पहावें तिकडे धान्यपिके, फळपिकें व पेयपिके दिसत होतीं. पीलगहवेला स्टेशनपासून चढावाच्या व घाटाच्या रस्त्याला सुरवात होते. जिकडे तिकडे गर्द झाडांनी आच्छादिलेले डोंगरच डोंगर दिसूं लागतात; येथें आपल्या घाटासारखे काळ्या खंडकाचे उघडे बोडके<noinclude></noinclude>
1rwvj44w64vzkmpk586sjb1khauibwj