विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.16 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk हरिपाठ/श्री एकनाथ हरिपाठ 0 5052 236073 236024 2026-08-24T05:37:08Z QueerEcofeminist 918 [[Special:Contributions/~2026-45827-91|~2026-45827-91]] ([[User talk:~2026-45827-91|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Itsgsmali|Itsgsmali]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. 227487 wikitext text/x-wiki {{शीर्ष | शीर्षक = श्री संत एकनाथ हरिपाठ | साहित्यिक = संत एकनाथ | विभाग = | मागील = | पुढील = | वर्ष = | टिपण = }} <poem> १ हरीचिया दासा हरि दाही दिशा . भावॆं जैसा तैसा हरि ऎक .. १.. हरी मुखीं गातां हरपली चिंता . त्या नाहीं मागुता जन्म घॆणॆं .. २.. जन्म घॆणॆं लागॆ वासनॆच्या संगॆ . तॆचि झालीं अंगॆं हरिरूप .. ३.. हरिरूप झालॆं जाणीव हरपलॆ . मीतूंपणा गॆलॆं हरीचॆ ठायीं ..४.. हरिरूप ध्यानीं हरिरूप मनीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २ हरि बॊला हरि बॊला नातरी अबॊला . व्यर्थ गलबला करूं नका .. १.. नकॊ अभिमान नकॊ नकॊ मान . सॊडीं मीतूंपण तॊचि सुखी .. २.. सुखी त्याणॆं व्हावॆं जगा निववावॆं . अज्ञानी लावावॆ सन्मार्गासी .. ३.. मार्ग जया कळॆ भावभक्तिबळॆं . जगाचियॆ मॆळॆ न दिसती .. ४.. जनीं वनीं प्रत्यक्ष लॊचनीं . ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं .. ५.. ३ ऒळखिला हरी धन्य तॊ संसारी . मॊक्ष त्याचॆ घरीं सिद्धीसहित .. १.. सिद्धी लावी पिसॆं कॊण तया पुसॆ . नॆलॆं राजहंसॆं पाणी काय .. २.. काय तॆं करावे संदॆहीं निर्गुण . ज्ञानानॆं सगुण ऒस कॆलॆं .. ३.. कॆलॆं कर्म झालॆं तॆंचि भॊगा आलॆं . उपजलॆ मॆलॆ ऐसॆ किती .. ४.. ऎका जनार्दनीं नाहीं यातायाती . सुखाची विश्रांती हरीसंगॆं .. ५.. ४ जॆं जॆं दृष्टी दिसॆ तॆं तॆं हरिरूप . पूजा ध्यान जप त्यासी नाहीं .. १.. वैकुंठ कैलासी तीर्थक्षॆत्रीं दॆव . तयाविण ठाव रिता कॊठॆं .. २.. वैष्णवांचॆं गुह्य मॊक्षांचा ऎकांत . अनंतासी अंत पाहतां नाहीं .. ३.. आदि मध्य अंत अवघा हरि ऎक . ऎकाचॆ अनॆक हरि करी .. ४.. ऎकाकार झालॆ जीव दॊन्ही तिन्ही . ऎका जनार्दनीं ऐसॆं कॆलॆं .. ५.. ५ नामाविण मुख सर्पाचॆं तॆं बीळ . जिव्हा नव्हे काळसर्प आहॆ .. १.. वाचा नव्हॆ लांब जळॊ त्याचॆं जिणॆं . यातना भॊगणॆं यमपुरीं .. २.. हरीविण कॊणी नाहीं सॊडविता . पुत्र बंधु कांता संपत्तीचॆ .. ३.. अंतकाळीं कॊणी नाहीं बा सांगाती . साधूचॆ संगतीं हरी जॊडॆ .. ४.. कॊटि कुळॆं तारी हरि अक्षरॆं दॊन्ही . ऎका जनार्दनीं पाठ कॆलीं .. ५.. ६ धन्य माय व्याली सुकृताचॆं फळ . फळ निर्फळ हरीविण .. १.. वॆदांताचॆं बीज हरि हरि अक्षरॆं . पवित्र सॊपारॆं हॆंचि ऎक .. २.. यॊग याग व्रत नॆम दानधर्म . नलगॆ साधन जपतां हरि .. ३.. साधनाचॆं सार नाम मुखीं गातां . हरि हरि म्हणतां कार्यसिद्धी .. ४.. नित्य मुक्त तॊचि ऎक ब्रह्मज्ञानी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. ७ बहुतां सुकृतॆं नरदॆह लाधला . भक्तीविण गॆला अधॊगती .. १.. पाप भाग्य कैसॆ न सरॆचि कर्म . न कळॆचि वर्म अरॆ मूढा .. २.. अनंत जन्मींचॆं सुकृत पदरीं . त्याचॆ मुखीं हरि पैठा हॊय .. ३.. राव रंक हॊ कां उंच नीच याती . भक्तीविण माती मुखीं त्याच्या .. ४.. ऎका जनार्दनीं हरि हरि म्हणतां . मुक्ती सायुज्यता पाठी लागॆ .. ५.. ८ हरिनामामृत सॆवी सावकाश . मॊक्ष त्याचॆ भूस दृष्टीपुढॆं .. १.. नित्य नामघॊष जयाचॆ मंदिरीं . तॆचि काशीपुरी तीर्थक्षॆत्र .. २.. वाराणसी तीर्थक्षॆत्रा नाश आहॆ . अविनाशासी पाहॆ नाश कैचा .. ३.. ऎका तासामाजीं कॊटि वॆळा सृष्टी . हॊती जाती दृष्टि पाहॆं तॊचि .. ४.. ऎका जनार्दनीं ऐसॆं किती झालॆं . हरिनाम सॆविलॆं तॊचि ऎक .. ५.. ९ भक्तीविण पशु कशासी वाढला . सटवीनॆ नॆला कैसा नाहीं .. १.. काय माय गॆली हॊती भूतापासीं . हरि न यॆ मुखासी अरॆ मूढा .. २.. पातकॆं करिता पुढॆं आहॆ पुसता . काय उत्तर दॆतां हॊशील तूं .. ३.. अनॆक यातना यम करवील . कॊण सॊडवील तॆथॆं तुजला .. ४.. ऎका जनार्दनीं सांगताहॆं तॊंडे . आहा वाचा रडॆ बॊलतांचि .. ५.. १० स्वहिताकारणॆं संगती साधूची . भावॆं भक्ति हरीची भॆटी तॆणॆं .. १.. हरि तॆथॆं संत संत तॆथॆं हरी . ऐसॆं वॆद चारी बॊलताती .. २.. ब्रह्मा डॊळसातॆं वॆदार्थ ना कळॆ . तॆथॆं हॆ आंधळॆ व्यर्थ हॊती .. ३.. वॆदार्थाचा गॊंवा कन्या अभिलाष . वॆदॆं नाहीं ऐसॆं सांगितलॆं .. ४.. वॆदांचीं हीं बीजाक्षरॆं हरी दॊनी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. ११ सत्पद तॆं ब्रह्म चित्पद तॆं माया . आनंदपदीं जया म्हणती हरी ||१|| सत्पद निर्गुण चित्पद सगुण . सगुण निर्गुण हरिपायीं || २|| तत्सदिति ऐसॆं पैल वस्तूवरी . गीतॆमाजी हरि बॊलियॆलॆ || ३|| हरिपदप्राप्ती भॊळ्या भाविकांसी . अभिमानियांसी नर्कवास || ४|| अस्ति भाति प्रिय ऐशीं पदॆं तिनी . ऎका जनार्दनीं तॆंचि झालॆं || ५|| १२ नाकळॆ तॆं कळॆ कळॆ तॆं नाकळॆ . वळॆ तॆं ना वळॆं गुरुविणॆं ||१|| निर्गुण पावलॆं सगुणीं भजतां . विकल्प धरितां जिव्हा झडॆ ||२ बहुरूपी घरी संन्यासाचा वॆष . पाहॊन तयास धन दॆती ||३|| संन्याशाला नाहीं बहुरूपियाला . सगुणीं भजला तॆथॆं पावॆ ||४|| अद्वैताचा खॆळ दिसॆ गुणागुणीं . ऎका जनार्दनीं ऒळखिलॆं ||५|| १३ ऒळखिला हरि सांठविला पॊटीं . हॊतां त्याची भॆटी दुःख कैंचॆं ||१|| नर अथवा नारी हॊ कां दुराचारी . मुखीं गातां हरि पवित्र तॊ ||२|| पवित्र तॆं कुळ धन्य त्याची माय . हरि मुखॆं गाय नित्य नॆमॆं ||३|| काम क्रॊध लॊभ जयाचॆ अंतरीं . नाहीं अधिकारी ऐसा यॆथॆं ||४|| वैष्णवांचॆं गुह्य काढिलॆं निवडुनी . ऎका जनार्दनीं हरि बॊला ||५|| १४ हरि बॊला दॆतां हरि बॊला घॆतां . हांसतां खॆळतां हरि बॊला ||१|| हरि बॊला गातां हरि बॊला खातां . सर्व कार्य करितां हरि बॊला ||२|| हरि बॊला ऎकांतीं हरि बॊला लॊकांतीं . दॆहत्यागा{अ}ंतीं हरि बॊला ||३|| हरि बॊला भांडतां हरि बॊला कांडतां . उठतां बैसतां हरि बॊला ||४|| हरि बॊला जनीं हरि बॊला विजनीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला ||५|| ‌ || भानुदास एकनाथ || १५ ऎक तीन पांच मॆळा पंचवीसाचा . छत्तिस तत्त्वांचा मूळ हरि .. १.. कल्पना अविद्या तॆणॆ झाला जीव . मायॊपाधी शिव बॊलिजॆति .. २.. जीव शिव दॊन्ही हरिरूपीं तरंग . सिंधु तॊ अभंग नॆणॆं हरी .. ३.. शुक्तीवरी रजत पाहतां डॊळां दिसॆ . रज्जूवरी भासॆ मिथ्या सर्प .. ४.. क्षॆत्र-क्षॆत्रज्ञातॆं जाणताती ज्ञानी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. १६ कल्पनॆपासूनी कल्पिला जॊ ठॆवा . तॆणॆं पडॆ गॊंवा नॆणॆ हरी .. १.. दिधल्या वांचूनि फळप्राप्ति कैंची . इच्छा कल्पनॆची व्यर्थ बापा .. २.. इच्छावॆ तॆ जवळी चरण हरीचॆ . चरण सर्व नारायण दॆतॊ तुज .. ३.. न सुटॆ कल्पना अभिमानाची गांठी . घॆतां जन्म कॊटी हरि कैंचा .. ४.. ऎका जनार्दनीं सांपडली खूण . कल्पना अभिमान हरि झाला .. ५.. १७ काय नपुंसका पद्मनीचॆ सॊहळॆ . वांझॆसी डोहाळॆ कैची हॊती .. १.. अंधापुढॆं दीप खरासी चंदन . सर्पासी दुधपान करूं नयॆ .. २.. क्रॊधि अविश्वासी त्यासी बॊध कैंचा . व्यर्थ आपुली वाचा शिणवूं नयॆ .. ३.. खळाची संगती उपयॊगासी नयॆ . आपणा अपाय त्याचॆ संगॆ .. ४.. वैष्णवीं कुपथ्य टाकिल वाळूनी . ऎका जनार्दनीं तॆचि भलॆ .. ५.. १८ न जायॆचि ताठा नित्य खटाटॊप . मंडूकी वटवट तैसॆ तॆ गा .. १.. प्रॆमावीण भजन नाकाविण मॊती . अर्थाविण पॊथी वाचुनी काय .. २.. कुंकवा नाहीं ठावॆ म्हणॆ मी आहॆव . भावावीण दॆव कैसा पावॆ .. ३.. अनुतापॆवीण भाव कैसा राहॆ . अनुभवॆं पाहॆं शॊधूनियां .. ४.. पाहतां पाहणॆं गॆलॆं तॆं शॊधूनी . ऎका जनार्दनीं अनुभविलॆं .. ५.. १९ परिमळ गॆलिया वॊस फुल दॆठीं . आयुष्या शॆवटीं दॆह तैसा .. १.. घडीघडी काळ वाट याची पाहॆ . अजून किती आहॆ अवकाश .. २.. हाचि अनुताप घॆऊन सावध . कांहीं तरी बॊध करीं मना .. ३.. ऎक तास उरला खट्वांग रायासी . भाग्यदशा कैसी प्राप्त झाली .. ४.. सांपडला हरि तयाला साधनीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २० करा रॆ बापांनॊ साधन हरीचॆं . झणीं करणीचॆं करूं नका .. १.. जॆणॆं नयॆ जन्म यमाची यातना . ऐशिया साधना करा कांहीं .. २.. साधनाचॆं सार मंत्रबीज हरी . आत्मतत्त्व धरी तॊचि ऎक .. ३.. कॊटि कॊटि यज्ञ नित्य ज्याचा नॆम . ऎक हरि नाम जपतां घडॆ .. ४.. ऎका जनार्दनीं न घ्यावा संशय . निश्चयॆंसी हॊय हरिरूप .. ५.. २१ बारा सॊळा जणी हरीसी नॆणती . म्हणॊनी फिरती रात्रंदिवस .. १.. सहस्र मुखांचा वर्णितां भागला . हर्ष जया झाला तॆणॆं सुखॆं .. २.. वॆद जाणूं गॆला पुढे मौनावला . तॆं गुह्य तुजला प्राप्त कैंचॆं .. ३.. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा . दास सद्गुरूचा तॊचि जाणॆ .. ४.. जाणतॆ नॆणतॆ हरीचॆ ठिकाणीं . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. २२ पिंडीं दॆहस्थिती ब्रह्मांडीं पसारा . हरिविण सार व्यर्थ भ्रम .. १.. शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिलमुनी . हरिसी जाणॊनि हरिच झालॆ .. २.. या रॆ या रॆ धरूं हरिनाम तारूं . भवाचा सागरू भय नाहीं .. ३.. साधुसंत गॆलॆ आनंदीं राहिलॆ . हरिनामॆं झालॆ कृतकृत्य .. ४.. ऎका जनार्दनीं मांडिलॆं दुकान . दॆतॊ मॊलावीण सर्व वस्तु .. ५.. २३ आवडीनॆं भावॆं हरिनाम घॆसी . तुझी चिंता त्यासी सर्व आहॆ .. १.. नकॊ खॆद करूं कॊणत्या गॊष्टीचा . पति तॊ लक्ष्मीचा जाणतसॆ .. २.. सकळ जीवांचा करितॊ सांभाळ . तुज मॊकलील ऐसॆं नाहीं .. ३.. जैसी स्थिति आहॆ तैशापरी राहॆं . कौतुक तूं पाहॆं संचिताचॆं .. ४.. ऎका जनार्दनीं भॊग प्रारब्धाचा . हरिकृपॆं त्याचा नाश झाला .. ५.. २४ दुर्बळाची कन्या समर्थानॆ कॆली . अवदसा निमाली दरिद्राची .. १.. हरिकृपा हॊतां भक्तां निघती दॊंदॆं . नाचती स्वानंदॆं हरिरंगीं .. २.. दॆव भक्त दॊन्ही ऎकरूप झालॆ . मुळींच संचलॆं जैसॆं तैसॆं .. ३.. पाजळली ज्यॊती कापुराची वाती . ऒवाळितां आरती भॆद नुरॆ .. ४.. ऎका जनार्दनीं कल्पॆंची मुराला . तॊचि झाला ब्रह्मरूप .. ५.. २५ मुद्रा ती पांचवी लावूनियां लक्ष . तॊ आत्मा प्रत्यक्ष हरि दिसॆ .. १.. कानीं जॆं पॆरिलॆं डॊळां तॆं उगवलॆं . व्यापकॆं भारलॆ तॊचि हरि .. २.. कर्म\-उपासना\-ज्ञानमार्गीं झालॆ . हरिपाठीं आलॆ सर्व मार्ग .. ३.. नित्य प्रॆमभावॆं हरिपाठ गाय . हरिकृपा हॊय तयावरी .. ४.. झाला हरिपाठ बॊलणॆं यॆथूनी . ऎका जनार्दनीं हरि बॊला .. ५.. अवघेंचि त्रैलोक्य आनंदाचें आतां । चरणीं जगन्नाथा चित्त ठेलें ॥१॥ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन ॥२॥ एका जनार्दनीं एकपणें उभा । चैतन्याची शोभा शोभतसे ॥३॥ -------------- नाथ परंपरा ------------- जो निर्गुण निराभास । जेथुनि उद्भव शबल ब्रह्मास । आदीनारायण म्हणती ज्यांस । तो सर्वांसी आदीगुरु || तयाचा ब्रह्मा अनुग्रहीत । ब्रह्मा अत्रीस उपदेशीत । अत्री पाद प्रसादीत । श्री अवधूत दत्तात्रय || दत्तात्रय परंपरा । सहस्त्रार्जुन यदु दुसरा । जनार्दन शिष्य तिसरा । केला खरा कलियुगी ॥ जनार्दन कृपेस्तव जाण । समूळ निरसलें भवबंधन । एका जनार्दनीं शरण । झाली संपूर्ण परंपरा || .. इति श्री ऎकनाथ हरिपाठ समाप्त .. </poem> {{प्रताधिकार मुक्त साहित्य}} [[वर्ग:तपासणी करायचे साहित्य‎]] [[वर्ग:प्रताधिकार मुक्त साहित्य-भारत]] [[वर्ग:भजने]] [[वर्ग:हरिपाठ]] m56zgjgszocys9a2hlhwedip72vexer अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf 106 74682 236102 236051 2026-08-24T11:29:08Z कल्पनाशक्ती 3813 236102 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सांगली आणि सांगलीकर |Language=mr |Volume= |Author=अविनाश टिळक |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=सांगली नगरवाचनालय |Address=सांगली |Year=2001 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} gv83q41lq18j6my38vmem60v6gq573o 236113 236102 2026-08-24T11:56:49Z कल्पनाशक्ती 3813 236113 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सांगली आणि सांगलीकर |Language=mr |Volume= |Author=अविनाश टिळक |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=सांगली नगरवाचनालय |Address=सांगली |Year=2001 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} bvwl1u1w4xxtnromb8p30msmfzdb09n पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३६ 104 77562 236091 176680 2026-08-24T11:00:30Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236091 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>उमटला. पुढे १९३२ मध्ये त्यानी श्रीनारायणराव केडगावकर याजकडून नाममंत्र घेतला. १९३३ साली परमसंत श्रीसद्गुरू बाबा सावनसिंगजी महाराज, बियास यांचा गुरूपदेश त्याना मिळाला. पुढे गुरूदेव रानडे यांचा अनेक वर्षे सहवास त्याना मिळाला. त्यामुळे "सुखदुःखे समेकृत्वा, लाभालाभौ जयाजयौ" अशाप्रकारची स्थितप्रज्ञ वृत्ती त्यांच्या अंगी स्वाभाविकपणे बाणली होती. ३६ वर्षे सांगली संस्थानचे राजपद भोगूनहि त्यांची वृत्ती विश्वस्ताची होती, म्हणूनच राजसंन्यास घेताना त्यांच्या मनाला कणभराचेही क्लेश झाले नाहीत. {{gap}}त्याना राजपद मिळणे हा एक योगायोगाचा आणि पूर्वजांच्या पुण्याईचा भाग होता. त्यांचे आजोबा सांगली संस्थानच्या पहिल्या अधिपतीना, श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब याना दत्तक गेले होते, पण दत्तक घेतल्या घेतल्या राजेसाहेबाना औरस संततीचा लाभ झाला! मग रद्दबातल झालेल्या दत्तकपुत्राला एकप्रकारची भरपायी म्हणून रु. २५०००/- ची जहागीर देण्यात आली आणि अशी नोंद करण्यात आली की भविष्यकाळात कधी 'गरज' पडली तर या रद्दबातल झालेल्या पटवर्धन घरातील सर्वात मोठ्या मुलाला दत्तक घ्यायचे. गमतीची गोष्ट म्हणजे पुढे खरोखरच अशी वेळ आली! सांगलीचे नंतरचे अधिपती श्रीमंत धुंडीराजसाहेब ऊर्फ तात्यासाहेब निपुत्रिक म्हणून १९०१ मध्ये निधन पावले. तेव्हा वर उल्लेखलेले विनायकराव म्हणजेच प्रस्तुत लेखविषय असलेले चिंतामणराव पटवर्धन दत्तक घेतले गेले. पूर्वीच्या करारानुसार. एकूण काय, तर आजोबांचा हुकलेला राजयोग नातवाच्या नशीबी होता! १५ जून १९०३ रोजी ब्रिटीश राज्यकर्त्यांकडून सांगलीचे तृतीय अधिपती म्हणून या श्रीमंत राजेसाहेबांची अधिकृत नियुक्ती झाली, अर्थात ब्रिटीशांच्या शिरस्त्याप्रमाणे, कॅ. बर्क या सांगली संस्थानात असलेल्या ॲडमिनिस्ट्रेटरकडून प्रश्नोत्तररूपी कठोर चाचपणी झाल्यानंतरच! दिवंगत राजेसाहेब कै. तात्यासाहेब पटवर्धन यांच्या पत्नीच्या, श्रीमंत बुध्दीमतीबाईसाहेब पटवर्धन यांच्या मांडीवर, राजेसाहेबाना समारंभपूर्वक दत्तक देण्यात आले. त्यावेळी चिंतामणराव पटवर्धन तथा आप्पासाहेबांचे वय अवघे तेरा वर्षाचे होते. {{gap}}तत्कालीन पध्दतीप्रमाणे राजेसाहेबाना राज्यकारभाराच्या दृष्टीने सुयोग्य शिक्षण मिळावे म्हणून जून १९०३ पासून ते एप्रिल १९०९ पर्यंत राजकुमार कॉलेज, राजकोट येथे ठेवण्यात आले. राजेसाहेबांच्या सुदैवाने तेथे त्याना नानासाहेब परांजपे हे ट्यूटर म्हणून लाभले. तरूण राजपुत्रांना त्यांच्या कलाने घेऊन चांगल्या सवयी कशा लावाव्यात याची त्याना चांगली जाण होती. नेमलेला अभ्यासक्रम पूर्ण करतानाच त्यानी राजेसाहेबांकडून जेम्स ॲलन या इंग्रज ग्रंथकाराची काही चांगली पुस्तके<noinclude>{{rule}} {{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................१२}}</noinclude> mwgy18ykk3u7gl4z0tfkzjh2arquedx पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३७ 104 77563 236092 176685 2026-08-24T11:02:53Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236092 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वाचून घेतली. त्या गोष्टीचा राजेसाहेबांच्या त्या वयातील संस्कारक्षम मनावर एवढा परिणाम झाला की त्यानी त्या पुस्तकाची पारायणे केली. त्यातील उतारेच्या उतारे ते पाठ म्हणून दाखवत. भावी जीवनात त्याना त्याचा अुपयोग झालाच, पण नकळत इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवायला ते पाठांतर कारणीभूत झाले. इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक मिळून त्याना राजकुमार कॉलेजात सुवर्णपदकहि मिळाले. शिक्षण पूर्ण करुन संस्थानात आल्यावर त्याना कॅप्टन बर्कसारख्या अत्यंत कर्तबगार अशा प्रशासकाचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले. त्यानीच राजेसाहेबांना राज्यकारभाराचे प्राथमिक धडे दिले. संस्थानच्या सर्व तालुक्यातून हिंडवून त्यांच्या प्रजाजनांबरोबर भेटी घडवून कितपत बोलावे, स्वतःचे टपाल स्वतःच फोडून कसे वाचावे, मग त्याविषयींचा प्राथमिक निर्णय कसा घ्यावा याचे अनेक धडे दिले. राजेसाहेबांच्या आज्ञाधारक वृत्तीमुळे कॅप्टनसाहेबांचे राजेसाहेबांवर पुत्रवत् प्रेम होते. सज्ञान झाल्यावर राजेसाहेबांच्या हाती कारभार सोपवून ते निघाले तेव्हा श्रीमंतानी, बर्कसाहेबाना आणखी काही काळ रहावे अशी विनंती केली. पण राजेसाहेबांचा हा आग्रह त्यानी थोड्याशा कठोरपणानेच मोडून काढला. मुलाचा पांगुळगाडा वेळीच सोडवावा असाच बर्कसाहेबांच्या त्या कृतीचा अर्थ होता. पण त्यामुळेच राजेसाहेबांचे कर्तृत्व भविष्यकाळात स्वतंत्रपणे फुलून आले! या बर्कसाहेबांबद्दल राजेसाहेब नेहमी कृतज्ञतापूर्वक बोलत. {{gap}}अितकी तयारी झाली खरी, तरीपण २०-२१व्या वर्षी एकदम संस्थानचा राज्यकारभार चालवायचा म्हणजे थोडे भांबावल्यासारखे होणे स्वाभाविकच. या भावनेतूनच राजेसाहेबानी राज्यसूत्रे हाती घेतल्यावर सुप्रसिध्द थिऑसॉफिस्ट डॉ. ॲनी बेझेंट याना मार्गदर्शन करा म्हणून पत्र लिहिले होते. त्यात ते लिहतात, "मुंबईत एखादा नवखा खेडवळ इसम पहिल्या प्रथम गेला म्हणजे जसा भांबावून जातो तशी माझी अवस्था झाली आहे. माझे शिक्षण बेताचेच व अनुभव तर मुळीच नाही, तेव्हा आपण मार्गदर्शन करून स्फूर्ती द्यावी." {{gap}}डॉ. ॲनी बेझेंट राजकीय पुढारी असल्याने, त्यांच्या हालचालीवर ब्रिटीश सरकारची करडी नजर असे, म्हणून त्यानी राजेसाहेबाना पत्राचे उत्तर पाठविले नाही. तथापि त्यांच्या सर्व शंकांचे समाधान होईल व कर्तव्याचा मार्ग सापडेल असे पुस्तकच त्यानी लिहून प्रसिध्द केले. त्यांच्या Letters to a young Indian Prince या पुस्तकाची जन्मकथा अशी आहे. आणि हा तरूण संस्थानिक म्हणजे सांगलीचे राजेसाहेब हे फारच थोड्या लोकाना माहीत असेल. {{gap}}राजेसाहेबानी राज्यसूत्रे हातात घेतली तेव्हा ब्रिटीश मुलुखात स्वातंत्र्याची चळवळ जोरात चालू होती. त्या चळवळीचे लोण संस्थानांत येऊ देऊ नये, ब्रिटीश<noinclude>{{rule}} {{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................१३}}</noinclude> gtlchizxocv3ko1ifk0es28as08soni पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३८ 104 77564 236093 176687 2026-08-24T11:04:52Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236093 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मुलुखातील पुढाऱ्यांचे संस्थानातील लोकांशी संबंध येऊ नयेत म्हणून राजेसाहेबांवर ब्रिटीश सरकारचे राजकीय दडपण असे. अितकेच काय पण त्याना एका स्वदेशी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे न गुंतवण्याबद्दल पण सांगण्यात आले होते. त्यामुळे एका बाजूला ब्रिटीश सरकार व दुसऱ्या बाजूला आपल्याच संस्थानची प्रजा, यामधील समतोल सांभाळताना राजेसाहेबाना अखेरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागली. आणि अशी कसरत त्यानी यशस्वीपणे केली हे विशेष. तरीपण एका वैयक्तिक प्रसंगात अतिरेक झाला तेव्हा त्याना आपली नैसर्गिक स्वाभिमानी वृत्ती प्रकट करावी लागली. तो प्रसंग असा: {{gap}}श्रीमंत राजेसाहेबाना पूर्ण अधिकार १९९० मध्ये मिळाल्यानंतर त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव आला. राजेसाहेबानी वऱ्हाडातील वजनदार पुढारी सर मोरोपंत जोशी यांची कन्या कमलाबाई याना रीतसर बघून आपली वधू म्हणून पसंत केली. पण हा विवाह ब्रिटीश राज्यकर्त्याना मान्य नव्हता. कारण उघड होते. सर मोरोपंत पुढारी होते आणि काँग्रेसला जवळचे होते. काँग्रेस ब्रिटीशांच्या विरोधात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढत होती. म्हणून तत्कालीन मुंबई सरकारकडून राजेसाहेबांवर हा विवाह रद्द व्हावा म्हणून दडपण येत होते. पण त्या विशीच्या वयात, नुकतेच राज्यावर बसलेले असतानासुद्धा, राजेसाहेबानी स्वतःच्या निर्णयाशी ठामपणे चिकटून राहण्याचे धैर्य दाखविले. त्या पारतंत्र्याच्या काळात ही गोष्ट नक्कीच अवघड होती. त्यानी स्पष्ट कळविले की "मी पाहून पसंत केलेल्या मुलीशीच लग्न करीन, त्यास सरकारची हरकत असेल तर आजन्म अविवाहित राहीन." शेवटी मोरोपंत जोशी यांचे स्नेही आणि नेमस्त पक्षाचे प्रख्यात पुढारी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यानी मध्यस्थी केली. मग विवाह सुरळीत पार पडला. (२९ जून १९१०) {{gap}}या एकाच घटनेवरून प्रत्येक बाबतीत संस्थानिकांची किती कुचंबणा होत असेल याची कल्पना यावी. इंग्रजी अमदानीत संस्थानिकाना राजकीय दास्यतेमुळे लष्करी पराक्रम दाखविण्यास वाव नव्हता, संधी नव्हती. हाती जी काही राजसत्ता होती त्यावर मर्यादा पडल्या होत्या. ब्रिटीश सरकारची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी नेहमी संशयाची असे. परिणामी, बहुतेक सर्व संस्थानिकांची जीवनदृष्टी प्रजेविषयीचे कर्तव्यपालन करण्यापेक्षा, खावे, प्यावे, मौजमजा करावी इतकीच राहिली. या प्रवृत्तीस अपवाद ठरलेले जे काही मोजके संस्थानिक होते, त्यात सांगलीचे राजेसाहेब एक होते. {{gap}}२ जून १९१० रोजी राजेसाहेबानी अधिकृतपणे राज्यसूत्रे हाती घेतली. तत्कालीन सांगली संस्थानचे क्षेत्रफळ ११३६ चौ. मैल इतके होते. पण सगळा मुलूख एकसंध<noinclude>{{rule}} {{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................१४}}</noinclude> 9j6fp18ul87gtj2rx5mk21maud0h7gm पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३९ 104 77565 236094 176689 2026-08-24T11:09:23Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236094 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नव्हता. महाराष्ट्र-कर्नाटकातील सोलापूर, सातारा, बेळगाव अशा जिल्ह्यातून पसरलेला होता. सांगली संस्थानची काही गावे (शहापूर, शिरहट्टी वगैरे) तर सांगलीपासून दीडशे- दोनशे मैल अशा अंतरावर होती. पण सुदैवाने राजेसाहेबांच्या अज्ञानकालात कॅप्टन बर्क यानी राज्यकारभाराची अुत्तम शिस्त बसवून दिली होती. १९०५ ते १९१० या त्यांच्या कारभारवर्षांत त्यानी रयतसभा सुरू केली. याचीच पुढे राजेसाहेबानी पद्धतशीर जोपासना केली. राजेसाहेबानी संस्थानचा कारभार हाकताना ब्रिटीशांच्या राज्यव्यवस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. "उत्कृष्ट राज्यकारभार हा राज्याचा कणा असतो" हे वचन प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. राजा हा जसा प्रजेचा मालक आहे तसा तो त्याचा सर्वात मोठा नोकर आहे, ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. आपला राज्यकारभार अुत्तम दर्जाचा रहावा या इच्छेपोटी राजेसाहेबानी ब्रिटीश मुलुखातून सेवानिवृत्त आय. सी. एस. अधिकारी, हायकोर्ट जजेस याना संस्थानात मोठ्या हुद्यांच्या जागांवर नेमले. सर पॅट्रिक कॅडेल, सर वाडिया, दिवाणबहाद्दुर ब्रह्म, बी. एन. डे, ढवळे यांसारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यामुळे सांगली संस्थानला लाभ झाला. अर्थात त्यांच्यावर कारभार सोपवून राजेसाहेब स्वस्थ बसत नसत. प्रत्येक खात्याकडे त्यांची चिकित्सक नजर असे. त्यामुळे संस्थानात कुठे खुट्ट झालं तरी त्याना त्याची जाणीव होई. संस्थानच्या प्रगतीसाठी त्यानी केलेल्या प्रयत्नांचा थोडक्यात असा आढावा घेता येईल. {{gap}}अनेक भूभागात पसरलेल्या सांगली संस्थानचे एकंदर सहा तालुके : १) मिरज प्रांत २) कुची ३) शहापूर ४) मंगळवेढे ५) तेरदाळ महाल ६) शिरहट्टी. राजेसाहेबानी संस्थानातील निसर्गसाधनसंपत्तीची शास्त्रशुध्द पध्दतीने पाहणी करुन त्या आधारे शेतीसुधारणा करण्याचे ठरविले. या सर्व तालुक्यातील जमिनीच्या सुधारणा करणेचे कामास अग्रहक्क देण्यात आला. ताली बांधण्याच्या कामाचे महत्त्व त्याना पटले. त्यामुळे जमिनीची धूप थांबून, पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून, त्याचा पिकास अुपयोग होण्याकरता समपातळीवर ताली घालणे हा जमीन सुधारण्याचा मुख्य पाया आहे, ही शेतकी अधिकाऱ्यांनी, त्यांची खात्री करून दिली व राजेसाहेबाना एवढी पटली, की आपल्या अधिकाऱ्यांसमवेत राजेसाहेब स्वतः संस्थानात सर्वत्र हिंडून ताली बांधण्याच्या कामाला त्यानी चालना दिली. प्रसंगी राजेसाहेबानी स्वतः बैलगाडीतून कष्टाचा प्रवास केला. बागायती शेती वाढविण्यासाठी मिरज प्रांत, कुची, शहापूर व तेरदाळ या तालुक्यातील नद्या-ओढे यावर धरणे बंधारे घालून घेतले, गाळाने भरलेले तलाव दुरूस्त केले. शेतीचे शिक्षण, पशुवैद्यकखात्याची मदत, ठिकठिकाणी शेतीच्या खताच्या योग्य साठवणीची पध्दत, फळझाडांची कलमे यासाठी संस्थानतर्फे खास योजना राबवल्या जाऊ लागल्या. सांगली संस्थानातील दूध उत्पादनाचे<noinclude>{{rule}} {{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................१५}}</noinclude> c8h3b9uvuaa45kjdzcuax708lh09xyu पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४० 104 77566 236095 176694 2026-08-24T11:11:51Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236095 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>प्रमाण पाहून, सर्व अद्ययावत साहित्याने युक्त अशी एक मोठी डेअरी काढण्यास राजेसाहेबानी प्रोत्साहन दिले. त्याकाळात सुध्दा ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष पुरविले जावे म्हणून 'ग्रामोद्योग योजना' राजेसाहेबानी सुरु ठेवली होती. एकूण करप्राप्तीचा विशिष्ट भाग यासाठी वापरला जात असे. संस्थानतर्फे दोन लाखांचे शेअर कॅपिटल घेऊन मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यात आली होती. {{gap}}आज महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीचा एवढा मोठा डोंगर अभा राहिलेला दिसतोय. पण त्याचा उगम दक्षिणेतील सांगली, औंधसारख्या संस्थानातून झाला आहे, याची कल्पना अनेकाना नसेल. पारतंत्र्याच्या कालात, जसजशी राजकीय जागृती होऊ लागली, तसतशी स्वदेशीची चळवळ मूळ धरू लागली. स्वदेशी चळवळ म्हणजे एकप्रकारे ब्रिटीश सत्तेवरचा हल्लाच. तेव्हा सरकारचा रोष पत्करून स्वदेशी अुत्पादनव्यवसायाला प्रोत्साहन देणे संस्थानिकाना अवघडच. १९०७ साली सुरू झालेल्या रेल्वेमुळे व्यापाराची मोठीच सोय झाली. दांडेकर, भिडे मंडळींच्या प्रयत्नातून लोखंडी मोटा, पिठाच्या चक्क्या, शेंगा फोडण्याची यंत्रे अशी अुत्पादने सुरु झाली. राजेसाहेबांच्या आधाराने विष्णुपंत तथा दादासाहेब वेलणकरानी वस्त्रोद्योगात पाऊल टाकून श्री गजानन मिल नावारूपाला आणली. सांगलीच्या आसपास साखर कारखाना नव्हता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे शिरगावकर बंधूंचा साखर कारखाना सांगली संस्थानातील उगारला अुभा राहिला. या सर्वांच्या प्रयत्नामुळे सांगली संस्थानात अुद्योगाची वाढ झाली. सांगली हळदीची पेठ म्हणून वर्षानुवर्षे सुविख्यात आहे. खेरीज गूळ, मिरची, शेंगा वगैरे सर्व प्रमुख मालाचा व्यापार सांगलीतून होतो. {{gap}}व्यापार अुद्योगधंदा म्हटला की हरघडीच्या व्यवहाराला बँकेची आवश्यकता आहे हे दिसून येताच राजेसाहेबानी स्वतःचे भांडवल घालून सांगली बँकेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. सांगलीच्या अुद्योगधंद्याच्या वाढीला या बँकेच्या स्थापनेमुळे मोठीच चालना मिळाली. {{gap}}या सर्व प्रयत्नांबरोबरच सांगलीची औद्योगिक, व्यापारी भरभराट होण्यास एक महत्वाचे कारण लक्षात घेणे आवश्यक आहे, ते म्हणजे राजेसाहेबानी निर्माण केलेली आणि जपलेली सुरक्षिततेची भावना. सांगलीत जीवित आणि वित्त सुरक्षित असल्याची भावना राजेसाहेबांच्या चोख राज्यकारभारामुळे, निःपक्षपाती न्यायव्यवस्थेमुळे वाढीस लागली. वेळप्रसंगी त्यांच्या कारभारविरोधात केलेली टीका सुध्दा सहनशीलतेने ऐकून घेण्याची राजेसाहेबांची प्रवृत्ती होती. इतर संस्थानांतून आढळणारा लहरीपणा, कायदा पायदळी तुडवून, 'हम करेसो कायदा' असा प्रकार येथे नव्हता. या सर्व गोष्टींचा सम्यक् परिणाम होऊन व्यापारी, अुद्योजक, सराफ, अडत्ये, सांगली संस्थानकडे आकर्षित झाले.{{nop}}<noinclude>{{rule}} {{rh|सांगली आणि सांगलीकर..............................................................१६}}</noinclude> tcy6bdi4d3ctrflhi0j49m6fy5jzvzx पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४१ 104 77567 236096 201950 2026-08-24T11:14:33Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236096 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}प्रत्येकाने संस्थानच्या उत्कर्षासाठी छोटे-मोठे काम करावे, अशी रास्त अपेक्षा ठेवणारे राजेसाहेब, स्वतः तसा विचार अहर्निश करीत. त्यामुळेच त्यानी नामवंत अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ आणि प्रा. डी. जी. कर्वे यांची कमिटी स्थापन केली. सांगली संस्थानच्या भौतिक संपत्तीचा अंदाज घेऊन तिचा विकास शेती व लहानमोठे अुद्योगधंदे या क्षेत्रात घडवून आणण्याच्या दृष्टीने या कमिटीला शिफारस करण्यास सांगण्यात आले होते. अुभ्या भारतवर्षात आदर्शभूत गणल्या गेलेल्या या कमिटीच्या शिफारसी कार्यान्वित करण्यासाठी प्रख्यात अर्थतज्ञ आणि विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. एम. लिमये या खास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. या विचारमंथनातूनच पुढे राजेसाहेबानी मुंबईचे सुप्रसिध्द अुद्योगपती श्री. वामन श्री आपटे यांचेबरोबर दोन कोटी भांडवलाचे कारखाने काढण्याचा करार केला. यातून साखर कारखाना, वनस्पती कारखाना, सूतगिरणीं, कापडगिरणी असे अनेक अुद्योगधंदे अुभे राहायचे होते. दहा लाखाची मशिनरी आली. दुर्दैवाने या साऱ्या योजनेवर पाणी पडले! गांधीहत्येनंतर झालेल्या दंगलीत सगळ्या योजनेची राखरांगोळी झाली. राजेसाहेबानी संस्थानच्या सर्वागीण विकासासाठी एक पंचवार्षिक योजना आखली होती. विलिनीकरणामुळे ती फलद्रूप झाली नाही ही गोष्ट वेगळी. पण अशी योजना आखणारे हे पहिलेच संस्थान असावे.<br> {{gap}}आज आम्ही लोकशाहीचे डांगोरे पिटतो पण लोकशाहीचे रोपटे रुजवण्याचा प्रयत्न राजेसाहेबानी किती पूर्वी केला होता, हे बघितल्यावर कुणाहि लोकशाहीप्रेमी माणसाचा अुर भरून येईल. बर्कसाहेबानी स्थापन केलेल्या रयतसभेला हळूहळू अधिकाधिक अधिकार देण्यास राजेसाहेबानी जाणीवपूर्वक सुरवात केली. १९३० साली रयतसभेला नियमबध्द स्वरूप दिले. तिच्या सरकारी-निमसरकारी सभासदांची संख्या वाढवली. अनेक प्रकारची मोकळीक दिली. त्याचा अनुकूल परिणाम पाहून १९३८ मध्ये संस्थानच्या कार्यकारी मंत्रिमंडळात दोन मंत्री, निवडून आलेल्या सभासदांमधून घेतले. पुढे १९४६ साली तर राज्यसभेस पूर्ण जबाबदार राज्यपद्धतीचे अधिकार दिले.<br> {{gap}}वास्तविक राजा आणि लोकशाही या परस्पर विरोधी संज्ञा. पण राजा असूनहि लोकशाही नांदू शकते ही वस्तुस्थिती इंग्लडची, तर राजा नसुनही लोकशाही नाही ही स्थिती रशियाची. या दोन्ही गोष्टी राजेसाहेबानी बघितल्या होत्या. नरेंद्रमंडळाचे प्रतिनिधित्व करताना ते इंग्लंडमधे राहिले होते. तेथील लोकशाही पाहून प्रभावित झाल्यामुळेच, त्यानी संस्थानात लोकशाही रूजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. राजसिंहासनावर असतानाच आपला 'राजसंन्यास' पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून, त्यांच्या मनाच्या प्रगल्भतेची कल्पना येते. लोकांमधील राजकीय हक्कांची<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..................................................... १७</noinclude> tizpi0c1zgkxq5iciyiyedx1s31zgym पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४२ 104 77568 236097 201951 2026-08-24T11:17:34Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236097 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>जाणीव आपल्याला भयभीत तर करत नाहीच, उलट राज्याच्या (म्हणजे संस्थानच्या) अंतिम हितासाठी ही गोष्ट अत्यावश्यक आहे हे सांगताना त्यानी म्हटलंय,<br> "It will be now for you, people of Sangli state, to rise to the stature of citizenship demanded by the democratic form of Government..............I am thankful to the Providence for enabling me to realize the dream of my life, in the opportunity vouchsafed to me to crown the constitutional reforms by the grant of responsible Govt." पूर्ण लोकनियुक्त राज्यपध्दतीचे अधिकार जनतेला प्रदान केल्यानंतर इंग्लंडच्या राजाप्रमाणे राजेसाहेबानी 'घटनात्मक राजाची' (Constitutional Head) भूमिका शब्दाच्या खऱ्या अर्थाने बजावली. लोकशाही प्रक्रिया, आपल्या छोट्या राज्यापुरती का होईना, पण यशस्वीपणे राबवली.<br>{{gap}}अशा या सुसंस्कृत राजाचा शिक्षणविषयक दृष्टिकोन प्रागतिक असणार हे सांगायला नकोच. प्राचीन वेदविद्येपासून तो अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्व प्रकारचे शिक्षण आपल्या संस्थानात असावे ही त्यांची धारणा होती. सांगलीच्या वेदशाळेत व शास्त्रशाळेत ऋग्वेद, यजुर्वेद, न्याय, व्याकरण, ज्योतिष अशा विविध प्रकारच्या शाखांच्या शिक्षणाची सोय होती. सर्व विद्यार्थ्याना दोन वेळचे भोजन व विनामूल्य वास्तव्य अशा सोयी देऊन शिक्षणाची व्यवस्था केली जात असे. सुप्रसिद्ध विद्वान पंडित आणि लेखक पं. महादेवशास्त्री जोशीनी या कामी राजेसाहेबानी दाखवलेल्या औदार्याचा फार आवर्जून अल्लेख केला आहे. संस्थान खालसा झाल्यावर हळूहळू हे वेदविद्येचे व्यासपीठ काळाच्या ओघात नाहीसे झाले ही फार दुर्दैवी आणि चुटपूट लावणारी बाब आहे. सांगली संस्थानात प्राथमिक शिक्षण तर मोफत होतेच पण सक्तीचेही होते. सांगलीतील सुप्रसिध्द, विलिंग्डन आणि वालचंद इंजिनियरींग कॉलेजच्या अभारणीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. शहापूरसारख्या दूरच्या ठिकाणीसुध्दा १९२० सालीच हायस्कूल सुरू झाले. शैक्षणिक व सामाजिक कार्यात राजेसाहेबांसह, फार मोठा सहभाग राणीसाहेब सौ. सरस्वतीदेवी यांचा होता. प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणाची सोय, निव्वळ मुलींसाठी हायस्कूल अशा विविध सोयी करण्यात त्यांचा सहभाग होता. राणी सरस्वतीदेवी कन्याशाळा, पुण्याची हुजूरपागा, सेवासदन, फर्ग्युसन कॉलेज अशा अनेक संस्थांना राजेसाहेबानी भरघोस देणग्या दिल्या. सांगलीत इतर संस्थानांसारखे भव्य वाडे, अत्तुंग प्रासाद नाहीत, पण आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनियरींग कॉलेजे म्हणजे राजेसाहेबांची केवढी हृद्य स्मारके आहेत.<br>{{gap}}राजेसाहेबानी ३७-३८ वर्षे राज्य केले पण रूढ अर्थाने राजेपण भोगले नाही. त्यांच्या जीवनात विलासी जीवनाचा, आत्यंतिक भोगवादाचा मागमूसही आढळत<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर................................................................. .१८</noinclude> 3qc8e1nw11vglhm9k2249js8qwl6fu7 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४३ 104 77569 236098 201952 2026-08-24T11:19:57Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236098 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे बालपणापासून अंगी रुजलेली आणि वाढत्या वयाबरोबर विकसित झालेली आध्यात्मिक वृत्ती. आपल्याभोवती संतप्रवृत्तीच्या माणसांना जमवून, त्यांची कदर करणारा त्यांच्यासारखा गुणग्राही राजा विरळा. याच भावनेतून श्रीमळणगावकर महाराज, श्रीनारायणमहाराज केडगावकर, सोनोपंत दांडेकर यांच्याशी त्यांचा संबंध आला. पंजाबमधील सुप्रसिद्ध संत सावनसिंग यांचा अनुग्रह त्यानी घेतला होता. गुरूदेव रानडे यांजसारखे एकान्तप्रिय संत, आपल्या निंबाळच्या आश्रमातून केवळ राजेसाहेबांमुळेच सांगलीत येऊन रहात. राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांजसारखे थोर तत्त्वज्ञ आवर्जून सांगलीस येत. तथापि राजेसाहेबांचे एक वैशिष्ट्य असे की त्यानी आपल्या अध्यात्मप्रेमाचा, राज्यकारभार वा अितर विहित कर्तव्ये यात बाधा येईल इतका अतिरेक कधी केला नाही.<br>{{gap}}सौजन्य, सहिष्णुता, दीर्घोद्योग, दातृत्व, परंपरेचा अभिमान असे अनेक गुणविशेष त्यांच्या ठिकाणी होतेच; पण यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे 'वाणीचे पावित्र्य' त्यानी कसे काय संभाळले हे एक कोडेच होते. राज्यकारभाराच्या ओघात मनाची अवस्था प्रक्षुब्ध होण्याचे प्रसंग अनेकदा येत असतील पण त्यांच्याबरोबर काम करणारे सांगतात की, मुखावाटे अभद्र भाषा क्वचितच बाहेर पडे! चेहेऱ्यावरील प्रसन्न वृत्ती आणि गोड हास्य सहसा लोप पावत नसे. इंग्रजीमधील 'जंटलमन' शब्दात अुत्कृष्टतेच्या आदर्शाची कल्पना सामावलेली आहे. कनिष्ठ, थोर, यांजबरोबरच्या संभाषणात, व्यवहारात त्यांची अभिजात सभ्यता दिसत असे. म्हणूनच पट्टाभिसितारामय्यासारखे राजकारणी असोत वा सी. व्ही. रमणसारखे नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञ असोत, सर्वचजण त्यांच्या जातिवंत सभ्यतेने भारावून जात. A Gentleman is a gentleman at all points असं म्हणतात ते त्यांच्याबाबतीत सर्वार्थाने खरं होतं.<br>{{gap}}याचा अर्थ असा नाही की राजेसाहेब संपूर्णपणे निर्दोष होते. हट्टीपणा, दुराग्रहीपणा, तापटपणा, प्रसंगोपात्त जरूर उफाळून येत असे, पण त्याचा अतिरेक कधी होत नसे. प्रजेला हक्क मिळवण्यासाठी झगडावे लागे, भांडावे लागे मग सभाबंदी, लाठीमार, तुरुंगवास असे प्रकार जरूर होत, पण हे सर्व म्हणजे खेळाचाच एक भाग होता. राजेसाहेबांच्या विरोधात लोकलढा चालवणारे प्रजापरिषदेचे पुढारी गणपतराव अभ्यंकर कठोर वाक्प्रहार करत. पण त्यानी सुध्दा एकदा जाहीरपणे सांगितले की “सांगलीत म्हणूनच मी अशी संस्थानी अंमलाविरूध्द चळवळ करू शकलो, इतरत्र हे अशक्य होते.” १९४२च्या आंदोलनात अरुणा असफअली, अच्युतराव पटवर्धन यासारखे क्रांतिवीर सांगलीत येऊन आश्रय घेऊ शकत असत. वसंतदादांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भूमिगत काळातील अड्डे सांगलीत अनेक<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर........................................................... .. १९</noinclude> 6ni09ztr9levcmg2z03i7y20yqngvf0 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४४ 104 77570 236099 201953 2026-08-24T11:23:01Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236099 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>ठिकाणी असत, हे आता सर्वश्रुत झाले आहे.<br>{{gap}}एखादा समंजस आणि शहाणा गृहस्थाश्रमी ज्याप्रमाणे सचोटीने वागून ठराविक अुत्पन्नात नेकीने संसार करतो, तसा राजेसाहेबानी सांगली संस्थानचा संसार केला. त्यानी राज्यसूत्रे हाती घेतली तेव्हा संस्थानचे उत्पन्न रु. १०,०७०००/- इतके होते, ते राजवटीच्या अखेरीस तिपटीचे वर म्हणजे रु.३३,४४०००।- इतके होते. संस्थानची शिल्लक, नगद रक्कम, सरकारी कर्जरोखे, बाहेरच्या ठेवी वगैरे जमेस धरून संस्थानची मालमत्ता, एक कोटी रूपयांपेक्षा थोडी अधिकच होती. सांगली संस्थानचा छोटा पसारा आणि पन्नास वर्षापूर्वीची रूपयाची किंमत लक्षात घेतली, तरच या शिलकीचे महत्त्व उमजेल. या संपन्नतेचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक बाबीवर उधळपट्टी न करता, शहाणपणाने केलेला खर्च, असेच द्यावे लागेल. हातात निरंकुश सत्ता असतानासुध्दा इतर अनेक संस्थानिकांप्रमाणे, राजेसाहेबानी कधीच डामडौल, अुधळपट्टी केली नाही. आपला स्वतःचा खाजगीचा खर्च १९३० पासूनच वेगळा ठेवला. अगदी जाणीवपूर्वक अगदी विलीनीकरणापर्यंत म्हणजे १९४८ सालपर्यंतसुद्धा खाजगी व दौलत (म्हणजे स्वतःचा कौटुंबिक खर्च आणि सर्व संस्थानी खर्च) यांची रीतसर विभागणी अनेक संस्थानातून झालेली नव्हती. ही वस्तुस्थिती इथे आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. १९३० मध्ये खाजगी नेमणूक, संस्थानी अुत्पन्नाच्या वीस टक्के होती तर तीच रक्कम १९४६-४७ च्या सुमारास १० टक्के इतकी खाली उतरली होती! वैयक्तिक डामडौलाचा मोह, राजेसाहेब संस्थानी हिताच्या बाबींचा विचार करून कसा टाळत, याचे एक आदर्श आणि बोलके अुदाहरण आहे. राजेसाहेब आणि त्यांचे कुटुंबीय सांगली गावाबाहेर माळबंगल्यावर राहात. हा भाग तसा ओसाड आणि निवासस्थानातील खोल्या जुन्या पध्दतीच्या होत्या. तेव्हा राजेसाहेबांसाठी एक भव्य 'राजप्रासाद' बांधण्यासाठी ६-७ लाखाची रक्कम वेगळी काढण्यात आली होती. त्याच सुमारास कृष्णा नदीच्या वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रजाजनाना त्रास होतो, वाहतूक अडते म्हणून कृष्णानदीवर मोठा पूल (सध्याचा आयर्विन ब्रिज) बांधण्याची निकड अुत्पन्न झाली. यासाठी संस्थानला पैसा कमी पडू लागला तेव्हा राजेसाहेबानी क्षणाचाही विचार न करता 'राजप्रासादाचा’ विचार बाजूला ठेवला आणि ती सारी रक्कम पुलाच्या कामासाठी वापरली! या पुलाने सांगलीकरांना पुण्या-मुंबईकडील विशाल जगताची कवाडे अघडून दिली. आयर्विन ब्रिजवरून मौजेने फेरफटका मारणाऱ्या सांगलीकरांनी या वस्तुस्थितीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवायला हवे! अशा अनेक हकीगती केवळ विस्तारभयास्तव सांगता येत नाहीत.<br>{{gap}}सांगलीच्या राजेसाहेबांचे सर्वगुणसंकीर्तन करताना असे म्हणावेसे वाटते की<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.......................................................... २०</noinclude> hijwyt8yxx9y7tr62u0j5oe2i9ng7pm पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४५ 104 77571 236100 201954 2026-08-24T11:25:38Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236100 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्यांची लोकप्रियता राजसिंहासनावरून पायअुतार झाल्यावरसुध्दा सांगलीकरांच्या मनात अढळपणे टिकून राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संस्थान खालसा झाल्यावर सांगलीतच स्थायिक होण्याचा त्यांचा निर्णय. वास्तविक जेथे राज्य केले तेथेच सामान्य प्रजाजन म्हणून राहायचं ही बाब दिसते तितकी आचरणास सोपी नाही. दरबार, पालखी, सलामी, जागोजागचे मानमरातब, संस्थानी नरेंद्रमंडळाच्या बैठका, परदेश वाऱ्या, दिल्लीच्या फेऱ्या, गर्व्हनर, व्हॉइसरायच्या गाठीभेटी सर्व काही बंद. पण जिथं प्राजक्ताची फुलं वेचली तिथं शेणकुटं कशी गोळा करू असा दळभद्री विचार राजेसाहेबांच्या मनाला कधी शिवलापण नाही. इतर ठिकाणचे संस्थानिक आपापला पैसा अडका, जडजवाहर गोळा करुन पुण्या-मुंबईकडे जाऊन राहिले. पण राजेसाहेब, रंगमंच गाजवणाऱ्या नायकाने, सहजपणे सामान्य प्रेक्षकात येऊन बसावे अितक्या सहजतेने सामान्य प्रजानन बनले, लोकात मिसळून गेले. सांगलीच्या उत्कर्षाच्या योजनांमध्ये त्यानी पूर्वीच्याच आत्मीयतेने त्यांनी रस घेतला. उलट ते कांही आपले राजे नाहीत तेंव्हा त्यांचा आपला काय संबंध, असे म्हणून अपरणे झटकण्याची वृत्ती सांगली संस्थानच्या प्रजाजनानी चुकून कधी दाखवली नाही. सांगली संस्थान खालसा झाल्यावर दहा-बारा वर्षानी संस्थानच्या जुन्या कर्नाटकी भागात, शिरहट्टी भागात, राजेसाहेब गेले असता, त्यांचे जे काही अभूतपूर्व स्वागत, मिरवणुका मानपत्रे अशा स्वरूपात झाले, तेव्हा हा स्थितप्रज्ञ राजा गहिवरून म्हणाला, “तुम्हा लोकांचे प्रेम बघून आम्ही खरोखर भारावून गेलो आहोत. हे प्रेम निरपेक्ष आहे. आता आमच्याकडून काहीही मिळण्याची परिस्थिती नाही, तशी तुमची अपेक्षाहि असण्याचे कारण नाही. तरीहि प्रेमाचा अुत्साह अनुपमेय आहे. त्यात कृत्रिमपणाचा अंशही नाही."<br>{{gap}}१९६० साली सांगलीच्या जनतेने राजेसाहेबांचा ७० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. भारत सरकारने पण त्याना 'पद्मभूषण' पदवी देऊन सन्मानित केले.<br>{{gap}}२३ फेब्रुवारी १९६५ रोजी शांतपणे हा लोकांचा राजा काळाच्या पडद्याआड गेला. तेव्हा प्रजाजन ढसढसा रडले तर नवल नाही पण त्यांच्या लाडक्या हत्तीने सुध्दा त्यांच्या पार्थिवावर मूकपणाने अश्रू ढाळले!<br>{{gap}}कृष्णामाईच्या काठावर हा राजा आता चिरनिद्रा घेत आहे. शेजारी वाहणारी कृष्णामाई पावसाळ्यात समाधीपाशी 'वर' येऊन तिच्यावर अभिषेक करते. या राजाच्या असीम त्यागापोटी, 'जनता-जनार्दनाच्या सेवेसाठी आपण अुभे आहोत' या जाणिवेने आयर्विन ब्रिज 'खडा' पहारा देत आहे.<br>{{gap}}जोवर कृष्णेचा प्रवाह अखंड वाहात राहील तोवर सच्चा सांगलीकर या आपल्या पित्यासमान राजाला कधीच विसरणार नाही, नव्हे विसरूच शकणार नाही!<br> {center|●●●}}{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर................................................................ .२१</noinclude> f53r7rp8glxu8r7xlhpnfqpja50hf6h पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४६ 104 77572 236101 201956 2026-08-24T11:28:24Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236101 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> {{center|{{x-larger|महाराष्ट्राचा आद्य नाटककार}}}} {{center|{{xx-larger|विष्णुदास भावे}}}} {{rule}} {{rule|height=4px}}{{rule}} <br> {{gap}}सांगलीला ‘नाट्यपंढरी' म्हणून अत्यंत श्रध्देने आणि भाविकतेने प्रथम गौरवले नटवर्य कै. केशवराव दाते यानी.<br>{{gap}}आणि हा गौरव प्राप्त करुन दिला सांगलीच्या सुपुत्राने. त्याचे नांव विष्णुदास भावे. मराठीतील पहिले नाटक 'सीतास्वयंवर' याचा प्रथम प्रयोग १८४३ साली त्यानी सांगलीत केला.दीडशेहून अधिक वर्षापूर्वी सुरु झालेला मराठी नाटकाचा हा अक्षय झरा, आता एखाद्या विशालकाय महासागराचे स्वरूप प्राप्त करुन बसला आहे, म्हणून विष्णुदास भावे याना सार्थपणे मराठी नाटकांचे 'जनक' म्हटले जाते. मात्र त्याना श्रेय देताना एका वस्तुस्थितीचा विसर पडतो. तो म्हणजे ज्यांच्या कल्पनेतून, प्रेरणेतून आणि भक्कम आश्रयातून हा पहिला वहिला नाट्यप्रयोग साकारला त्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन या सांगली संस्थानच्या पहिल्या अधिपतीचे कळत नकळत विस्मरण होते. विष्णुदास भावे यांच्या बरोबरीने मराठी नाट्यसृष्टी जन्मास घालण्याचे श्रेय त्याना आहे.<br>{{gap}}या ऐतिहासिक घटनेला १९४३ साली शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून समस्त नाट्यप्रेमी जनतेने सांगलीला नाट्यशताब्दी अत्सव थाटामाटात साजरा केला. त्याच प्रसंगी सांगलीचे ‘नाट्यपंढरी' हे कौतुकाचे बारसे केशवराव दाते यानी केले.<br>{{gap}}पण हे विष्णुदास भावे होते तरी कोण?<br>{{gap}}मराठी नाटकाला जन्म देणारा माणूस म्हणजे कुणी तरी विद्वान, पंडित असावा अशीच कोणाचीहि प्रथम कल्पना होईल. पण प्रत्यक्षात विष्णुदास भावे हे तसे अगदी सर्वसामान्य गृहस्थ होते. निदान 'सीतास्वयंवर' नाटकाच्या प्रथम प्रयोगाच्या वेळी तरी. त्यांचा ज्ञात असलेला जीवनपट अलगडून बघितला तर काय आढळेल? तर विष्णुदास कधी चित्रकार, कधी मूर्तिकार, कधी बांधकामतज्ञ, तर कधी चिनी मातीच्या बरण्या बनवू पहाणारा कारखानदार अशा विविध रूपात ते भेटतील. क्वचित् प्रसंगी शेती कसणाऱ्या चक्क शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसतील. एकूण कृष्णाकाठचा हा ब्राह्मण अठरा पगड जातीच्या कलाकुसरीत रमलेला दिसेल! अर्थात या सर्वच कलांचे ज्ञान<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर............................................................................... .२२</noinclude> ixwweuxzzcldor7t0wv3jydwwromzaz पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४७ 104 77573 236103 201958 2026-08-24T11:31:53Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236103 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्यांच्या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात एकवटलेले होते ही वस्तुस्थिती आहे.<br> {{gap}}अशा या विष्णुदासांचा जन्म १८१९/२० सालचा असावा! त्यांचे अधिकृत चरित्र लिहिणाऱ्या चरित्रकाराने म्हणजे प्रत्यक्षात त्यांचे नातू असणाऱ्या रावसाहेब भावे यानी सुध्दा नक्की तारीख दिलेली नाही. भावेमंडळी मूळची कोकणातली. नशीब काढायला इतर अनेक घराणी देशावर आली तसे हे भावेघराणे देशावर आले. विष्णुपंत भावे यांचे वडील अमृतरावभाऊ सांगली संस्थानच्या लष्करात होते. लहानपणापासून विष्णुपंत जात्या व्रात्यच होते. त्यांचे बालपण आजोळी म्हणजे सावळगीस गेले. कानडी मुलुखातील या गावातील वास्तव्यामुळे त्याना कन्नड भाषा अवगत झाली. झाडावर चढणे, पतंग अुडवणे अशा अुनाडक्या करण्याकडे त्यांचा कल असे. तत्कालीन रिवाजाप्रमाणे संध्या, पूजाअर्चा, वैश्वदेव, रुद्र त्याना शिकवला गेला होता. वयाच्या ११-१२व्या वर्षी सांगलीत आल्यावर, त्रिंबकपंतगुरुजी नावाचे एक शिक्षक होते, त्यांजकडे मराठी अक्षर, थोडाफार हिशोब, जमाखर्च वगैरे शिक्षण झाले. १८३०-३१च्या काळात शिक्षण असे ते काय असणार? वर्ष दीड वर्ष शिकले, पण अधिक ओढा गाण्या-बजावण्याकडे होता. त्यावेळी सांगली संस्थान दरबारात, सखारामबुवा काशीकर नावाचे गायक होते. त्या काळातील नावाजलेले गायक अब्दुल्लखान यांचे ते शिष्य होते. या सखारामबुवांकडे विष्णुपंत गाणे शिकण्यास जात. बरंचसं गाणं आणि तालाच्या बारकाव्याचं शिक्षण त्याना बुवांकडे मिळालं. पेशवाईचा अंत होऊन ब्रिटीश अंमल स्थिरावलेला होता. मर्दुमकी गाजवण्याला वावच नव्हता म्हणून लोक गाण्याबजावण्यात, लावण्या गुणगुणण्यात मशगूल होते. अशा लोकांमध्ये विष्णुपंताचा वावर जास्ती असे. मात्र त्यामुळे त्याना काही मिश्र रागातील लावण्यांच्या चाली अवगत झाल्या. नंतर विष्णुपंतांची, मंत्र-तंत्र करणाऱ्या एका मांत्रिकबुवांशी ओळख झाली. ती ओळख एवढी घट्ट झाली की त्या बुवाबरोबर पळून गेले. घरच्या लोकानी शोधाशोध करुन पाठलाग केला. विष्णुपंतांची समजूत घातली. बुवांची समजावणी केली. शेवटी बुवानीच विष्णुपंताना सांगितले की “तू आता परत जाऊन पंचमुखी मारुतीची आराधना कर म्हणजे तुला संपत्ती, संतती आणि कीर्ती यांचा लाभ होईल.” तेव्हा कुठे स्वारी परत आली. पंचमुखी मारुतीची आराधना चालू असतानाच त्याना चित्रकलेची आणि शिल्पकलेची आवड लागली. शाडू तयार करुन मातीची चित्रे बनवण्याचा त्याना छंद लागला. सांगली गावाचा देखावा, बाजार, श्रीमंत सरकारांची चित्रे त्यानी तयार केली.<br>{{gap}}एकदा श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब (पहिले) फिरत फिरत विष्णुपंताचे वडील भाऊसाहेब याजकडे आले होते. घरातील सर्वाचे क्षेमकुशल विचारले. मुलांची विचारपूस केली. सर्वाची माहिती देता देता विष्णुपंतांचे वडील, विष्णुपंतांविषयी मात्र<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..................................................................................................... .२३</noinclude> 222461zp17g3jcbrdfiiicgqc2erlua 236104 236103 2026-08-24T11:32:42Z कल्पनाशक्ती 3813 236104 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्यांच्या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात एकवटलेले होते ही वस्तुस्थिती आहे.<br> {{gap}}अशा या विष्णुदासांचा जन्म १८१९/२० सालचा असावा! त्यांचे अधिकृत चरित्र लिहिणाऱ्या चरित्रकाराने म्हणजे प्रत्यक्षात त्यांचे नातू असणाऱ्या रावसाहेब भावे यानी सुध्दा नक्की तारीख दिलेली नाही. भावेमंडळी मूळची कोकणातली. नशीब काढायला इतर अनेक घराणी देशावर आली तसे हे भावेघराणे देशावर आले. विष्णुपंत भावे यांचे वडील अमृतरावभाऊ सांगली संस्थानच्या लष्करात होते. लहानपणापासून विष्णुपंत जात्या व्रात्यच होते. त्यांचे बालपण आजोळी म्हणजे सावळगीस गेले. कानडी मुलुखातील या गावातील वास्तव्यामुळे त्याना कन्नड भाषा अवगत झाली. झाडावर चढणे, पतंग अुडवणे अशा अुनाडक्या करण्याकडे त्यांचा कल असे. तत्कालीन रिवाजाप्रमाणे संध्या, पूजाअर्चा, वैश्वदेव, रुद्र त्याना शिकवला गेला होता. वयाच्या ११-१२व्या वर्षी सांगलीत आल्यावर, त्रिंबकपंतगुरुजी नावाचे एक शिक्षक होते, त्यांजकडे मराठी अक्षर, थोडाफार हिशोब, जमाखर्च वगैरे शिक्षण झाले. १८३०-३१च्या काळात शिक्षण असे ते काय असणार? वर्ष दीड वर्ष शिकले, पण अधिक ओढा गाण्या-बजावण्याकडे होता. त्यावेळी सांगली संस्थान दरबारात, सखारामबुवा काशीकर नावाचे गायक होते. त्या काळातील नावाजलेले गायक अब्दुल्लखान यांचे ते शिष्य होते. या सखारामबुवांकडे विष्णुपंत गाणे शिकण्यास जात. बरंचसं गाणं आणि तालाच्या बारकाव्याचं शिक्षण त्याना बुवांकडे मिळालं. पेशवाईचा अंत होऊन ब्रिटीश अंमल स्थिरावलेला होता. मर्दुमकी गाजवण्याला वावच नव्हता म्हणून लोक गाण्याबजावण्यात, लावण्या गुणगुणण्यात मशगूल होते. अशा लोकांमध्ये विष्णुपंताचा वावर जास्ती असे. मात्र त्यामुळे त्याना काही मिश्र रागातील लावण्यांच्या चाली अवगत झाल्या. नंतर विष्णुपंतांची, मंत्र-तंत्र करणाऱ्या एका मांत्रिकबुवांशी ओळख झाली. ती ओळख एवढी घट्ट झाली की त्या बुवाबरोबर पळून गेले. घरच्या लोकानी शोधाशोध करुन पाठलाग केला. विष्णुपंतांची समजूत घातली. बुवांची समजावणी केली. शेवटी बुवानीच विष्णुपंताना सांगितले की “तू आता परत जाऊन पंचमुखी मारुतीची आराधना कर म्हणजे तुला संपत्ती, संतती आणि कीर्ती यांचा लाभ होईल.” तेव्हा कुठे स्वारी परत आली. पंचमुखी मारुतीची आराधना चालू असतानाच त्याना चित्रकलेची आणि शिल्पकलेची आवड लागली. शाडू तयार करुन मातीची चित्रे बनवण्याचा त्याना छंद लागला. सांगली गावाचा देखावा, बाजार, श्रीमंत सरकारांची चित्रे त्यानी तयार केली.<br>{{gap}}एकदा श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब (पहिले) फिरत फिरत विष्णुपंताचे वडील भाऊसाहेब याजकडे आले होते. घरातील सर्वाचे क्षेमकुशल विचारले. मुलांची विचारपूस केली. सर्वाची माहिती देता देता विष्णुपंतांचे वडील, विष्णुपंतांविषयी मात्र<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.........................................२३</noinclude> qy7lklpyiryxu0h5wbsymsqwtmlmddf पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४८ 104 77574 236105 201959 2026-08-24T11:35:31Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236105 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नाराजीने 'हा मुलगा नुसता अुनाडक्या करतो शाडू बनवून मातीची चित्रे करत बसतो" वगैरे सांगितले. श्रीमंतानी चित्रे पहाण्याची अिच्छा व्यक्त केल्यावर विष्णुपंतानी सगळी चित्रे मांडली. इतक्या लहान वयातील मुलाचे हे कर्तृत्व पाहून तो गुणग्राही राजा आश्चर्यचकित झाला. असा गुणी मुलगा आपल्याजवळ असायला हवा अशा हेतूने त्यानी त्याला आपल्या खाजगीकडे घेतला.<br>{{gap}}अशा तऱ्हेने राजवाड्यात विष्णुपंतांचा शिरकाव झाला. त्या मंत्रतंत्रवाल्या बुवाने सांगितलेलं भविष्य खरं व्हायचं होतं तर!<br>{{gap}}श्रीमंतानी पूजा-अर्चा, जप- जाप्य या सर्व कामात विष्णुपंत त्यांच्या दिमतीस असत. याच काळात श्रीमंतानी त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वेगवेगळ्या कसोट्या घेऊन त्यांची परीक्षा पाहिली होती. श्रीमंताना रात्री लौकर झोप येत नसे, तेव्हा ते विष्णुपंतांकडून रामविजय, हरिविजय, शिवलीलामृत, कथासारामृत, भक्तिलीलामृत वाचून घेत असत. मग वाचून झाल्यावर श्रीमंत, विष्णुपंताना मुद्दाम प्रश्न करीत. "बघ किती छान गोष्टी आहेत. अशा आजच्या काळात लिहिता तरी येतील का?" मग डिवचलेल्या विष्णुपंताना आवेश चढे. आव्हान स्वीकारल्यासारखे करुन ते म्हणत "त्यात काय ? सहज लिहता येईल." मग एक दिवस श्रीमंतानी त्याना एका कथेतील, "जगात सत्यवर्तनाचे फळ" या तात्पर्यावर गोष्ट लिही बघू." असे म्हटले. मग विष्णुपंतानी चिंतन करुन कल्पकतेने "सत्यदास" नावाची रसभरीत गोष्ट लिहून दाखवली. गोष्ट ऐकून श्रीमंत खूश झाले. मग काय? अुभयतांमधील एक न्यारा खेळच सुरु झाला. अशाप्रकारे लिहिलेल्या पाच-पंचवीस गोष्टींचे सहज एखादे पुस्तक झाले असते.<br>{{gap}}पण सहजी घडलेल्या या खेळातून श्रीमंताना विष्णुपंतांच्या सुप्त गुणांची यथार्थ कल्पना आली असेल आणि विष्णुपंतानाही आपल्या ठायी काही वेगळी प्रतिभा आहे याची जाणीव झाली असेल.<br>{{gap}}नियतीच त्यांच्याकडून हा खेळ खेळवून घेत असावी. त्यातूनच एक इतिहास घडणार होता.<br>{{gap}}श्रीमंत आप्पासाहेब हे गुणग्राही होतेच. त्यांच्या रसिकतेमुळे दूरदूरचे शास्त्री, पंडित, गवई, चित्रकारापासून, पहिलवान, अश्वरोहणतज्ञ, निरनिराळी अमदी जनावरे घेऊन हिंडणारे सौदागर अशा सर्व प्रकारचे लोक सांगलीत येत असत आणि राजेसाहेब त्यांची परीक्षा घेऊन प्रत्येकाचा यथायोग्य परामर्श घेत असत. याच काळात केव्हातरी शाहीर अनंत फंदी सांगलीस राजेसाहेबांकडे येऊन राहिले होते. त्यांच्याबरोबर विष्णुपंतांचा काळ फार आनंदात जाई. त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून विष्णुपंताना खूप काही गवसले, जे त्याना भावी काळात अपयोगी पडले. त्यामुळे<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..........................२४</noinclude> 3qhtvm9kbgejh9difk46p813181xdql पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४९ 104 77575 236106 201960 2026-08-24T11:37:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236106 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>विष्णुपंताना त्या सुमारास ब्रिटीश फौजेत नोकरी मिळण्याची संधी आली होती तरी श्रीमंतानी त्याना सोडले नाही.<br>{{gap}}ती वेळ जवळ आली होती. मराठी नाटक जन्माला येण्याची.<br>{{gap}}१८४२ साली अशीच कर्नाटकातील भागवत नावाची दशावतारी खेळ करणारी मंडळी सांगलीस आपले खेळ घेऊन आली. राजेसाहेबानी त्यांच्या परिपाठाप्रमाणे त्या मंडळींचे दोन-दोन प्रयोग श्री गणपती मंदिरात केले. त्या खेळात विचित्र वेष घेऊन सर्व मंडळी अपस्वरात गात व नाचत. त्यातील सर्व पात्रे वयाने थोराड. स्त्री भूमिका करणारी ४०-४२ वर्षाची मंडळी होती. त्यांची सोंगे विद्रूप दिसत, भाषणे नुसती धांगडधिंगा स्वरूपाची, कलाहीन, त्यामुळे श्रीमंताना किळस आली. ते स्वतः रसिक आणि गुणग्राही होते. तेव्हा त्यांच्या मनात ठिणगी पडली. जुन्या पौराणिक कथांवर आधारित, सर्व स्त्री-पुरूषाना एकत्र बसून पाहण्याजोगी एखादी कलाकृती तयार करता आली तर? जवळ बसलेल्या विष्णुपंताना ते म्हणाले. "तुम्ही मनावर घ्याल तर यापेक्षा चांगल्या नाट्यकृती लोकांपुढे आणू शकाल. आम्ही सर्वप्रकारे तुम्हाला साहाय्य करु."<br>{{gap}}विष्णुपंतांच्या ठिकाणी असलेली कल्पकता व रचनाचातुर्य श्रीमंत जाणून होते. आणि विष्णुपंत काय? सदैव अुत्साहाने रसरसलेले. नवीन काही करायचे म्हटले की त्याना स्फुरण चढे. श्रीमंताचे बोलणे ऐकून ते आव्हान त्यानी ताबडतोब स्वीकारले.<br>{{gap}}पण थोड्याच दिवसात त्याना कळून चुकले की आपले स्वीकारलेले आणि ते सुध्दा आव्हान म्हणून, काम खरंच कठीण आहे. काम करायला नटवर्गच मिळेना. नटवेष घेणे म्हणजे हलक्या दर्जाचे काम म्हणून कोणी पुढे येईना. शेवटी श्रीमंतांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून, अशी दवंडी पिटण्यात आली की नाटकात काम करणाऱ्या मंडळीना श्रीमंत वंशपरंपरेच्या जमिनी देणार आहेत व सरकारी नोकरीत ठेवणार आहेत! याचा अपेक्षित परिणाम झाला. माणसं जमू लागली. स्त्रीभूमिकेकरिता कोकणातून सुस्वरूप, चुणचुणीत मुलं आणली गेली. नंतर आपल्या चित्रकलेचे, शिल्पकलेचे ज्ञान पणाला लावून विष्णुपंतांनी पात्राला लागणारी किरिट कुंडले, बाहुभूषणे, कमरेच्या मेखला वगैरे स्वहस्ते बनविल्या ऋषीवेषांकरिता लागणाऱ्या दाढ्या, मिशा, जटा, स्त्रीवेषाकरता लागणारे टोप, अलंकार, स्वतः विणून तयार केले. देव, दैत्य, स्त्रीपार्टी, ऋषिपार्टी इत्यादी पात्रांकरता योग्य अशा सोंगांच्या नकला स्वतः लिहून काढल्या. सर्व पात्रांनी त्या पाठ केल्यावर, शृंगार, वीर, करूण रसाला अनुकूल असे हावभाव कसे करावेत याचे शिक्षण दिले. स्वतः हावभाव करून भाषणे म्हणून दाखविली. यापुढचे अवघड काम म्हणजे नाटकातील गाणी. नाटकाला योग्य अशी काव्ये कुठून मिळणार? मग सर्वांस<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.........................२५</noinclude> n2xw3ewti4ceyo37vqabxlxmaenp5em पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५० 104 77576 236107 201989 2026-08-24T11:40:49Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236107 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>समजतील अशी नाटकाची पदे त्यानी स्वतः लिहून काढली! गाण्या- बजावण्याचा पूर्वीचा छंद त्यांच्या अुपयोगी पडला. रागदारी- मिश्र कविता करुन सूत्रधाराची कामे करणाऱ्याना चांगली स्वरतालावर म्हणण्यास शिकविली.<br>{{gap}}थोडक्यात आजच्या भाषेत म्हणजे विष्णुपंत या नाटकाचे 'सबकुछ' होते!<br>{{gap}}श्रीमंत राजेसाहेबानी या नाटकाच्या कामाकरिता एक वेगळीच इमारत बांधून दिली होती. तिथंच ह्या नाटकाची अभारणी व तयारी झाली.<br>{{gap}}याप्रमाणे सर्व सिद्धता झाल्यावर १८४३ साली श्रीमंत राजेसाहेब व त्यांच्याबरोबरची निवडक मंडळी यांच्यासमोर मराठी रंगभूमीवरच्या पहिल्या नाटकाचा प्रयोग झाला. या ऐतिहासिक घटनेच्या मागे विष्णुपंतांचे जे परिश्रम होते त्याला खरोखर तोड नव्हती.<br>{{gap}}या पहिल्या नाटकाचे नाव होते 'सीतास्वयंवर'. पात्रांची सजावट, निवड व सुरस कथाभाग यामुळे प्रयोग चांगला वठला. श्रीमंत खूष झाले. त्यानी विष्णुपंतांची खूप वाहवा केली. भागवत मंडळींच्या बीभत्स धांगडधिग्याच्या पार्श्वभूमीवर हे नाटक सर्वाना आवडले.<br>{{gap}}या यशानंतर एक गंमत झाली. थोड्याशा धार्मिक कारणाने म्हणा वा मत्सरापोटी म्हणा, विष्णुपंतावर व इतर नटवर्गावर बहिष्कार पडला! ही मंडळी आली की सर्वजण अठून जात. "नटवेष घेणे ही गोष्ट धर्मबाह्य आहे, सबब त्यांजशी कोणी पंगती व्यवहार करु नये" असा प्रचार सुरु झाला. शेवटी श्रीमंत राजेसाहेबानी विद्वान, शास्त्री- पंडित, सभ्य प्रतिष्ठित अशा लोकांची सभा बोलावली. सभेत वे.शा. आप्पाशास्त्री साठे, आगाशे अशा मंडळीनी जुन्या ग्रंथांचे आधार दाखवून नटवेष घेणे कसे दोषास्पद नाही याचे पूर्ण विवरण केले. सर्व नाटकमंडळींबरोबर सर्वानी मिळून भोजन केले.<br>{{gap}}या 'सीतास्वयंवर' नाटकाचे जसजसे प्रयोग होऊ लागले तसतशी नाटकात सुधारणा होऊ लागली. प्रारंभी सूत्रधार सरस्वती- आवाहनांची पदे म्हणत असे. मग तो सर्व देवतांच्या स्तवनपर गीतानी वातावरण भारून टाकी. "पात्रांच्या अंगी अुत्तम वक्तृत्वशक्ती व धीटपणा यावा" असा वर मागून घेई. सूत्रधार नाटकाचे कथानक, प्रसंग वगैरेची प्रस्तावना करी. मग पात्रे आपापली भाषणे कथानकाच्या अनुषंगाने म्हणत असत व प्रसंगानुसार सूत्रधार व त्याचे गायकमंडळ प्रथमपासून अखेरपर्यंत सर्व पदे म्हणत !,<br> {{gap}}श्रीमंतांच्या प्रोत्साहनामुळे 'सीतास्वयंवर' प्रमाणे विष्णुपंतानी, रामायणातील प्रसंगांवर ८-१० नाटके रचली. श्रीमंताना स्वतःला हा नवीन करमणुकीचा प्रकार<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर................................२६<br></noinclude> ovc38dihbaum05w26lr5hzthfk731bt पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५१ 104 77577 236108 202163 2026-08-24T11:43:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236108 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>एवढा आवडला की संस्थानला भेट द्यायला मोठा पाहुणा आला की लागलीच विष्णुपंतांच्या नाटकाचे प्रयोग होत. सुरुवातीला नाटक हा शब्द लोकांमध्ये फारसा रुढ झाला नव्हता. सगळा रामायणाचा कथाभाग म्हणून लोक 'राम अवतारी खेळ' असे म्हणत!<br>{{gap}}श्रीमंताच्या सूचनेनुसार विष्णुपंतानी इतर कथानकांवर 'कृष्णजन्म' 'अत्तर- गोग्रहण' अशी नाटके रचली. विष्णुपंतांची एकूण बुद्धिमत्ता, त्यांच्या कर्तबगारीचा आवाका बघून श्रीमंत, त्यांच्या नाटकमंडळींकरता कायमस्वरूपी इनाम जमिनी देण्याच्या विचारात होते.<br>{{gap}}पण खुद्द श्रीमंतच आजारी पडले व त्यातच त्यांचा अंत झाला. (१८५१)<br>{{gap}}आता मात्र विष्णुपंतांचे (आता ते विष्णुदास झाले होते. नाटकातील पद्यात त्यानी आपला निर्देश 'विष्णुदास' या नावाने करायला प्रारंभ केला होता.) दिवस फिरले. श्रीमंत आप्पासाहेबांच्या निधनानंतर, गादीवर बसलेले श्रीमंत तात्यासाहेब अल्पवयीन असल्याने, सर्व कारभार पोलिटिकल एजंटाच्या हातात होता! बाकी कुणाची सहानुभूती नव्हती. डोक्यावर नाटकाच्या खर्चाचा बोजा मात्र हकनाक बसला. सरकारातून कर्जफेडीस मदत होईना. या घालमेलीतून बाहेरगावी दौरे करायचा विष्णुदासानी विचार केला.<br>{{gap}}आज जसे आपण नाटकमंडळी दौऱ्यावर निघाली म्हणतो तसे त्या काळी 'स्वारीवर' निघाली असे म्हणत.<br>{{gap}}प्रवासास लागणारी भांडीकुंडी, अंथरूणे-पांघरुणे, नाटकाचे साहित्य (प्रॉपर्टी) वगैरे घेऊन १८५२ मध्ये विष्णुदास 'पहिली स्वारी' करण्याकरता सांगलीबाहेर पडले.<br>{{gap}}तासगाव, मिरज, कागवाड, जमखंडी, मुधोळ, कोल्हापूर अशा अनेक गावांतून प्रयोग झाले. बरेच प्रयोग होऊन खर्च वजा जाता विष्णुदास नाटक मंडळीला बऱ्यापैकी पैसा, कपडालत्ता मिळाला. या अुत्पन्नामधून मंडळींजवळ नाटकी संच, स्वतःचे अुंची कपडे झाले.<br> {{gap}}पहिल्या स्वारीतून स्फूर्ती घेऊन विष्णुदासानी १८५३मध्ये दुसरी स्वारी (दौरा) आरंभली. कऱ्हाड, सातारा, फलटण, बारामती करुन मंडळी पुण्यात आली. पुण्यात बुधवार चौकात, आंबेकराच्या बोळातील, सांगलीकरांच्या वाड्यात मांडव घालून नाटकांचे प्रयोग होऊ लागले. पुण्यात प्रो. केरोपंत छत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, वगैरे मंडळीनी वाहवा केल्याने बऱ्यापैकी पैसा मिळाला. पुण्यास नाटकवाली मंडळी अशी प्रथमच आली होती.{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर......................२७</noinclude> khnsbd9dx8v73kwk010dcq8qfmw9j6v पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५२ 104 77578 236109 202164 2026-08-24T11:46:50Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236109 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}पुण्याहून पुढे ही नाटकमंडळी मुंबईस गेली. तेथेहि नाटकगृहे नव्हती. इंग्रजी नाटके होत त्या ग्रँटरोड थिअटरला पाचपाचशे रु. भाडे असे. त्यामुळे विष्णुदास फणसवाडी, ठाकुरद्वार येथे मांडव घालून नाटके करीत. मराठी नाटक हा करमणुकीचा अभिनव प्रयोग असल्याने मुंबईकराना खूप अप्रूप वाटले. मग तेथील पारशी, गुजराथी, युरोपियन लोकाना मराठी नाटक समजणार नाही म्हणून मुंबईच्या मुक्कामातच 'गोपीचंद' नाटक हिंदी भाषेत लिहून ताबडतोब त्याचा प्रयोग सादर केला. म्हणजे हिंदी नाट्यसृष्टीचे जनक म्हणून विष्णुदासांचेच नाव घ्यावे लागते. त्या नाटकाला अभूतपूर्व गर्दी होऊन त्या काळात १८०० रुपयांची विक्रमी तिकिटविक्री झाली. मुंबईच्या धनिक गुजराथी लोकानी पैशाची भरपूर अधळण केली. डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या मध्यस्थीने, गव्हर्नरसाहेबांच्या सेक्रेटरीने विलायतेस नाटक कंपनी नेण्याचे सुचवले. पण धर्माज्ञेचे अल्लंघन होईल म्हणून विष्णुपंतानी ही सूचना नाकारली.<br>{{gap}}१८६२ पर्यंत विष्णुपंतानी अशा तीन स्वाऱ्या केल्या. यशस्वी केल्या. स्वतःला आणि अितरांना आर्थिक सुबत्ता मिळवून दिली. श्रीमंत आप्पासाहेबांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या नाटक मंडळींची जी दैना झाली त्यातून सर्वजण सावरले. चार पैसे सर्वांच्या खिशात खुळखुळू लागले. विष्णुदासानी नाटकाचा एक धन व कीर्ती मिळवणेचा धंदा महाराष्ट्राला नव्याने मिळवून दिला.<br>{{gap}}आणि मग मात्र महाराष्ट्रात जे नेहमी होते तेच झाले.<br>{{gap}}त्यांच्या नाटकमंडळीतील अनेक नटानी वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. राहिलेल्या मंडळींत भांडणे सुरू झाली. त्यामुळे नवीन काही नाटके लिहावीत, खटाटोप करुन बसवावीत अितकी मनाची अुमेद, वैतागून गेलेल्या विष्णुदासाना राहिली नाही. कंटाळून विष्णुदासानी नाटक धंद्यास रामराम ठोकला.<br>{{gap}}महाराष्ट्राचे आद्य नाटककार म्हणून त्यांची कारकीर्द संपली. पण विष्णुदासांचे अुर्वरित जीवन खरोखर ते विलक्षण अद्भुतरीत्या जगले, म्हणून मुद्दाम अुद्धृत करावेसे वाटते.<br>{{gap}}यानंतरच्या काळात विष्णुदासानी जमखंडी, कोल्हापूर, हैदराबाद अशा विविध ठिकाणी विविध कामे केली. नंतर त्यांची अुडी अुत्तर हिंदुस्थानात ग्वाल्हेरपर्यंत गेली! एवढ्या काळात या नाटककाराने काय काय अुद्योग केले पहा.<br>{{gap}}सांगलीकर राजेमंडळींबरोबर आप्पासाहेबांच्या निधनानंतर कायम तैनात मिळण्याच्या दृष्टीने विष्णुदासांचे फारसे जमले नाही. दरबारी राजकारणे आणि त्यांचा स्वतःचा फटकळ स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यांचे फारसे सूत जमले नाही. पण<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.............................२८</noinclude> rqpo9a3s5z1vd4b86ownqsc4fgm20au पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५३ 104 77579 236110 202166 2026-08-24T11:50:32Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236110 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वेळोवेळी काही संस्थानी कामे त्यानी केली. आजच्या गणपतीमंदिराच्या मागील बाजूस श्रीमंत स्वारीसाठी म्हणून जी निवासस्थाने बांधण्यात आली त्याचे 'बिल्डिंग सुपरवायझर' विष्णुपंत होते. सांगलीकरांकडे जो लग्नसोहळा झाला त्यावेळी लग्नाचा मंडप अुभारणीपासूनची सर्व देखरेख त्यांची होती.<br>{{gap}}जमखंडी संस्थानातील बंगले, देवीचे देऊळ, शाळा, दवाखाना व इतर अलिशान इमारतींचे काम विष्णुदासांच्या देखरेखीखाली झाले. जमखंडीच्या वास्तव्यात चिनी मातीचे खुजे व बरण्या बनविण्यास योग्य अशी माती त्याना आजूबाजूला आढळली. मग विष्णुदासानी काय करावे? तसे खुजे व बरण्या त्यानी चक्क बनविल्या. त्यावर ग्लेझिंग केले. तेव्हा असा एक कारखाना घालण्याचीच तयारी त्यानी चालविली. पण जमखंडीकरानी अनुकूलता दाखवली नाही म्हणून त्यांचा हा बेत बारगळला!<br>{{gap}}नंतर कोल्हापूरला कळंबा तलावाच्या कामावर काही काळ त्यानी काम केले. पुढे डिसुझा नावाच्या ख्रिश्चन माणसाच्या नादाने विष्णुदास हैदराबादला गेले. तेथे कौले, विटा बनविण्याच्या कारखान्यात त्यानी काही दिवस काम केले.<br>{{gap}}श्री. गणेश नारायण कर्वे या गृहस्थाच्या निमंत्रणावरुन विष्णुदासानी वयाची सत्तरी पार केल्यावरच्या वृध्दापकाळात, ग्वाल्हेरकडे कूच केले. तिथे या कर्व्यांना नाटककंपनी काढायची होती म्हणून त्याना मदत केली. त्यावेळी श्री. कर्वे याजकडे कसला तरी अुत्सव होता म्हणून विष्णुदासानी त्याना एक देवतेची मूर्ती बनवून दिली. ही मूर्ती एवढी देखणी बनली की अक्षरशः अख्खं ग्वाल्हेर ती मूर्ती पहाण्यासाठी लोटलं. ही करामत आणि नाट्यक्षेत्रातील त्यांची अद्भुत कामगिरी ग्वाल्हेरच्या महाराजांच्या कानावर गेली. मग जयाजीराव शिंदे सरकारनी त्याना मानाने बोलावून त्यांचा सन्मान केला. शिंदे सरकाराना पाहिजे तसली मूर्ती विष्णुदासानी बनवून तर दिलीच पण त्यांच्या बागेसाठी एक रहाटगाडगेहि बनवून दिले!<br>{{gap}}या हकीगती वाचून या माणसाच्या विलक्षण बुध्दीमत्तेची कल्पना येते की नाही? हे अुद्योग कमी पडले म्हणून की काय शेवटच्या अतारवयात घरच्या घरी झाडांची पाने अणि फुले यांपासून रंग अुत्पन्न करण्याचे त्यांचे प्रयोग चालू होते. तरुण वयात शेती करुन बघितली होतीच. म्हातारपणी आपल्या अंगणातील 'प्रयोगशाळेत' 'इनक्लाइंड प्लेन' वर केवळ वजनाच्या योगाने दोन मोटा चालणारे यंत्र तयार करण्याचा त्यांचा खटाटोप चालू होताच!<br>{{gap}}खरोखर हरहुन्नरी विष्णुदासांच्या अंगी किती कला होत्या याची झलक पाहूनच आश्चर्याने तोंडात बोट जाते!<br>{{gap}}पण या माणसाला 'विश्वकर्मा' म्हणायचा मोह व्हावा अशी आणखी एक विलक्षण गोष्ट त्यानी केली होती. ती म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ.{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..............................२९</noinclude> p7p5i3zea6arb92f5k0y9od2eg00b4i पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५४ 104 77580 236111 202167 2026-08-24T11:52:59Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236111 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}नाटकांचे प्रयोग चालू असताना शिकवून तयार केलेले नट अचानक सोडून जात. त्याचा विष्णुदासांना त्रास होई. अशी जिवंत माणसं त्रास देणारी आहेत तर आपण 'निर्जीव' वस्तूंपासून काही करुन घेऊ शकतो का? असं काही करुन पाहण्याची अुर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली. किती विलक्षण जिद्द! त्यांच्या नेहमीच्या अुद्योगी स्वभावानुसार ते या कल्पनेच्या पाठपुराव्यास लागले. यातूनच जिवंत हाडामासांच्या नटांवर अवलंबून न राहता, आपण काष्ठांकडून नाट्यसेवा घडवून घेऊ अशी हिंमत धरून त्यानी कळसूत्री बाहुल्या तयार केल्या. या खेळासाठी ज्या बाहुल्या त्यानी तयार केल्या त्याचे हातपाय, तोंड, मान, डोळे, ओठ, अितकेच काय पण बोटांची पेरी वगैरे अवयवसुध्दा नैसर्गिकरीत्या हालविण्याची अपूर्व कल्पकता त्यानी दाखविली. सूत्रे हालविणारा एकच माणूस सर्व पात्रांची भाषणे, वेगवेगळ्या आवाजात (स्त्री- पुरुष पात्रानुसार) करी. त्यामुळे अनेक पात्रे बोलत असावीत असा मोठा शब्द चमत्कार किंवा शब्दभ्रम विष्णुदासानी निर्माण केला.<br>{{gap}}आजच्या काळात बाहुल्यांचा खेळ करून अत्यंत लोकप्रिय झालेल्या श्री. रामदास पाध्ये यानी विष्णुदास भावे यांचे ऋण मान्य केले आहे. ३१ ऑक्टोबर १९९२ च्या रविवारच्या 'लोकसत्ते' त विष्णुदासांच्या या क्षेत्रातील कामगिरीचा त्यानी मोठा गौरव केला आहे. त्यानी विष्णुदासांच्या बाहुल्यांची अनेक वैशिष्ट्ये सांगताना म्हटलं आहे की त्यांच्या प्रत्येक बाहुलीला स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं. रंगभूमीवर जी भूमिका असेल त्याला अनुरूप अशीच बाहुलीची बांधणी असे. या बाहुल्या संपूर्णपणे लाकडाच्या बनवलेल्या असत. त्यासाठी वजनाला हलके असे अंबराचे लाकूड ते वापरत. या सर्व बाहुल्या विष्णुदासानी स्वतः हाताने बनवलेल्या होत्या. दुर्दैवाने १९४८ मध्ये जाळपोळ झाली त्यामध्ये बऱ्याचशा बाहुल्या आगीमध्ये भस्मसात झाल्या. अलीकडेच, जुलै २००० मध्ये यापैकी कांही बाहुल्याना रंगरंगोटी, वेषभूषा करून मुंबईचे सुप्रसिद्ध शब्दविभ्रमकार, श्री रामदास पाध्ये यांनी विष्णुदासांचे "द्रौपदी स्वयंवर" हे नाटक सादर केले.<br>{{gap}}आजच्या जमान्यात दूरदर्शनवरील बोलक्या बाहुल्यांचा शब्दभ्रम ऐकूनही स्तिमित होणारी आम्ही माणसं! मग शंभर, सव्वाशे वर्षापूर्वीच्या काळात अशी 'करामत' करता येत असेल तर त्या विलक्षण पुरुषाला 'विश्वकर्मा' म्हणायचे का आणखी काही?<br>{{gap}}असा हा 'मुलुखावेगळा माणूस' सांगलीत वारंवार अुद्भवणाऱ्या प्लेगच्या साथीला बळी पडून ९ ऑगस्ट १९०१ रोजी मृत्युमुखी पडला.<br>{{gap}}एखाद्या सर्वसामान्य हरहुन्नरी माणसाचे एरवी एवढं कौतुक वाटलं नसतं पण हा माणूस ‘महाराष्ट्राचा आद्य नाटककार' म्हणून ते कौतुक अधिकच गहिरं बनतं.<br>{{gap}}आणि असा हा 'महाराष्ट्राचा भरतमुनी' सांगलीचा होता म्हणून प्रत्येक नाट्यप्रेमी सांगलीकराच्या भावना अचंबळून येतील यात शंका नाही!<br>{{right|●●●}}{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर........................३०</noinclude> 52c33xp9811t67mlxetumqkp53197yt पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५५ 104 77581 236112 202170 2026-08-24T11:56:04Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236112 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><Br> {{center|{{x-larger|नाट्यसेवेला सर्वस्व मानणारे}}}} {{center|{{xx-larger|नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}महाराष्ट्राच्या नाट्य-अितिहासातील पहिल्या पाच प्रमुख मराठी नाटककारांपैकी तीन नाटककार सांगली गावातील असावेत ही किती अभिमानाची बाब आहे! मराठी नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे, खऱ्या अर्थाने ज्याना नाट्याचार्य म्हणता येईल असे गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ही तीन दैवते म्हणजे सांगलीकरांसाठी नाट्यक्षेत्रातील ब्रह्मा विष्णू महेशच! विष्णुदासानी मराठी रंगभूमीची स्थापना केली पण त्याचबरोबर नाट्यक्षेत्राहून भिन्न असे अनेक व्यवसाय त्यानी केले. खाडिलकरानी नाट्यव्यवसायाच्या बरोबरीने किंबहुना अधिकच असा पत्रकारितेचा व्यवसाय केला. याउलट देवलानी केवळ नाटक हेच आपले जीवितकार्य मानले. चरितार्थासाठी म्हणून नोकरी केली पण ती सुध्दा अल्पकाळ. एरवी नाट्यलेखन आणि नाट्यशिक्षण यामध्येच आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.<br>{{gap}}नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म, सांगली गावाच्या नैऋत्येस असलेल्या अडीच मैलांवरील हरिपूर गावात १३ नोव्हेंबर १८५५ रोजी झाला. हरिपूर गाव कृष्णा नदी व वारणा नदी यांच्या संगमावर आहे. शेजारीच संगमेश्वराचे मंदिर असल्याने या गावास तीर्थक्षेत्राचे महत्त्व आहे. पटवर्धन संस्थानापैकी मिरजमळा (बुधगाव) संस्थानच्या हद्दीत हे गाव होते. गोविंदरावांचे वडील बाळाजीपंत हे बुधगावकर राजेसाहेबांच्या नोकरीत होते. सरकारी कुरणांवर देखरेख करण्याचे त्यांचे काम असे. त्याबद्दल त्याना दरमहा रु.३/- एवढा पगार होता! गोविंदराव देवलाना कृष्णाजीपंत व रामभाऊ असे दोन थोरले बंधू होते. तत्कालीन सांगलीकरांप्रमाणे पोहण्याची खास आवड गोविंदरावाना होतीच. थोरले बंधू कृष्णाजीपंत हे मोठे कर्तबगार गृहस्थ होते. रेव्हेन्यू खात्यात कारकुनी करता करता अखेर कृष्णाजीपंत हुजूर डेप्युटी कलेक्टर म्हणून निवृत्त झाले. ते संगीतशात्राचे जाणकार होते. त्यानी 'फिलहार्मानिक सोसायटी' नावाची संस्था स्थापन केली व शास्त्रोक्त बावीस श्रुतींच्या वाद्यांचा प्रसार केला. मधले बंधु रामभाऊ, 'इचलकरंजीकर' नाटक मंडळीत नावाजलेले नट होते. कदाचित या पार्श्वभूमीमुळेच संगीत आणि नाट्य या दोहोंचे गोविंदरावांवर कळत नकळत संस्कार झाले असावेत.<br>{{gap}}याहुन महत्त्वाचे म्हणजे जवळच्याच सांगलीत विष्णुदास भावे यांच्यामुळे<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..............................३१</noinclude> siw4qmz6hjdnqfuu3ukkauozr813cuz अनुक्रमणिका:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf 106 104089 236074 236059 2026-08-24T08:25:38Z कल्पनाशक्ती 3813 236074 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=लंकेचें वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1934 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो" 62="कँडी व पेरेडॅनिया" 66="फोटो" /> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 2eevwriax8xmr17wepxizuldcwk2oga पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६२ 104 111852 236075 236071 2026-08-24T08:32:04Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236075 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ४ थें.'''}}}} {{rule|7em}} {{center|{{x-larger|'''कँडी व पेरेडॅनिया.'''}}}} {{rule|5em}}<br>{{gap}}{{x-larger|'''मुं'''}}'''बई''' इलाख्याच्या मुंबईप्रमाणें लंका बेटाचें कोलंबो हे समुद्र किनाऱ्यावर व समुद्र सपाटीवर असलेलें मोठें बंदर, व्यापाराचें मुख्य केन्द्र व नव्या ब्रिटिश राजवटीचें राजधानीचें, शहर आहे; तर पुण्याप्रमाणें '''कँडी''' हे जुन्या राजवटींचें राजधानीचें, समुद्र सपाटीपासून सुमारें सोळाशे सतराशें फूट उंचीवर असलेलें व डोंगरटेंकड्यांनी तटबंदी केलेले शहर आहे. '''कोलंबो'''पासून '''कँडीला''' रेलवेनें किंवा मोटारबसनें जातां येतें. मी ता. ५ दिजंबर १९३३ रोजी दुपारच्या दोन वाजतांच्या गाडीनें कँडीस जाण्यास निघालों. कोलंबोपासून कँडी ७४ मैल आहे. सेकंड क्लासचें भाडे सुमारें साडेतीन रुपये पडले. कोलंबोपासून '''पोलगहवेला''' नांवाच्या पंचेचाळीस मैलांवर असलेल्या स्टेशनपर्यंत साधारण सपाटीच्याच भागांतून आगगाडी जाते. कारण '''पोलगहवेला''' समुद्रसपाटीपासून अवघ्या २४० फूट उंचीवर आहे. हा भूमिभाग पाणथळ जमिनीचा आहे. वाटोवाट तलावासारखा पाण्यानें तुडुंब भरलेला भूमिभाग लागत होता. या सखल जागेत अर्थात् भातांचीं पिके लावलेलीं होतीं; उंचवट्याच्या जागांवर, टेकड्यांवर व डोंगराळ भागांवर नारळी, पोफळी, केळी (लंका बेटांतील सर्वगामी पिकें) व मधून मधून रबराच्या उंच उच झाडांच्या रायाच राया लागत होत्या. तुरळक चहाचीं झुडपेंही दृष्टीस पडत होती. पण लंकेच्या हवापाण्याची व पावसाच्या मुबलकतेची मौज ही कीं येथली एक इंचभर जागाही नापीक नव्हती. जिकडे पहावें तिकडे '''धान्यपिके, फळपिकें व पेयपिके''' दिसत होतीं. पीलगहवेला स्टेशनपासून चढावाच्या व घाटाच्या रस्त्याला सुरवात होते. जिकडे तिकडे गर्द झाडांनी आच्छादिलेले डोंगरच डोंगर दिसूं लागतात; येथें आपल्या घाटासारखे काळ्या खडकाचे उघडे बोडके<noinclude></noinclude> 84z7aonfsisx6umuctoyx54altbjxmr सदस्य चर्चा:शुभा 3 111853 236072 2026-08-24T05:05:12Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 236072 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=शुभा}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १०:३५, २४ ऑगस्ट २०२६ (IST) pcq83jtdqlh07cfyzqb8tgqsr4pdac5 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६३ 104 111854 236076 2026-08-24T08:41:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236076 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५२ |लंकेचं वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>व निर्वृक्ष असे डोंगर दिसत नाहींत. हा घाटाचा रस्ता खंडाळ्याच्या घाटाप्रमाणे मोठ्या बोगद्यांतून बाहेर पडून कर्जतपर्यंत गेलेल्या डोंगराच्या शिडीवजा रांगेच्या डाव्या उजव्या बगलेनें व बोगद्या-बोगद्यांतून जात नाहीं, तर एका घोड्याच्या नालासारख्या डोंगराच्या रांगेच्या एकाच बगलेच्या बाजूबाजूनें अर्धवर्तुळाकार पण वरवर चढत जातो. पण सर्व डोंगर नारळ, पोफळ व केळी यांच्या झाडांनी घनदाट भरलेले दिसतात. डोंगराच्या वरच्या बाजूस चहाचीं झुडपें व त्यांना सावली व्हावी म्हणून मधून मधून लावलेलीं सिल्व्हर ओक व भेंडीसारखी '''दडव''' नांवाचीं झांडें दिसत होती. कोलंबो- कँडीचा हा घाट कांहींसा वाई पांचगणी घाटासारखा आहे.<Br>{{gap}}आरबी भाषेतील गोष्टीप्रमाणें एखाद्या जादुगारानें वाई नजीकच्या त शेतजमिनीचा भाग धान्यपिके व फळपिके यांनी हिरवाहिरवा गार केला व वाईपासून पांचगणीपर्यंतची अर्धवर्तुळाकार डोंगरांची रांग नारळ पोफळ, केळी व इतर झाडे यांनी गर्दछाय केली तर वाई-पांचगणी घाटामध्यें व कोलंबो-कँडी घाटामध्यें पुष्कळ साम्य उत्पन्न होईल. भर पावसाळ्यांत ज्याप्रमाणे खंडाळ्याच्या घाटामध्यें जिकडे तिकडे नदी नाले खळखळ वाहणाऱ्या पाण्यानें तुडुंब भरलेले असतात व जिकडे पहावें तिकडे पाणीच पाणी दिसतें, तसाच देखावा या घाटांतून दिजंबर महिन्यांत सुद्धां दिसतो. याप्रमाणें आश्चर्यचकित मनानें मी सारखा सभोंवारचा सुंदर देखावा पहात होतो. घाट चढल्यावर आम्ही '''कडूगनवा''' नावाच्या घाटमाथ्यावरील स्टेशनला येऊन पोहोंचलों. या स्टेशनचा गांव बराच मोठा वाटला. येथें एक स्मारकस्तंभ बांधलेला दिसला. मार्गदर्शक पुस्तकावरून कळलें कीं हा स्तंभ या घाटाच्या गाडीरस्त्याच्या योजक एंजिनीयराच्या स्मारकार्थ बांधलेला आहे. हें स्टेशन सुमारें सतराशें फुट उंच असून तें पोलगहवेला स्टेशनपासून वीस मैल अंतरावर आहे. अर्थात् हा कँडीचा घाट वीस मैलांचा आहे व वीस मैलांत गाडी पंधराशें फुट चढते. येथून मग डोंगराळ पण साधारण उंच सखल असा<noinclude></noinclude> rta25qefwne6az0bfre4on1k5knhh8r पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/३ 104 111855 236077 2026-08-24T08:42:20Z ~2026-46135-33 6181 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "<br></br> <br></br> गोष्ट एका डॉक्टरची </br> <br></br> पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१२</br> <br></br> © डॉ. विठ्ठल प्रभू</br> २ सी, शिवसागर</br> पांडुरंग नाईक रोड</br> राजा बढे चौक, शिवाजी पार्क</br> मुंबई - ४०००१६</br> दूरध्वनी (०..." 236077 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="2402:E280:3E70:27:A5B3:A7E1:FFA2:356B" /></noinclude><br></br> <br></br> गोष्ट एका डॉक्टरची </br> <br></br> पहिली आवृत्ती : सप्टेंबर २०१२</br> <br></br> © डॉ. विठ्ठल प्रभू</br> २ सी, शिवसागर</br> पांडुरंग नाईक रोड</br> राजा बढे चौक, शिवाजी पार्क</br> मुंबई - ४०००१६</br> दूरध्वनी (०२२) २४४५२०६५</br> भ्रमणध्वनी : ९८२०६७५८१५</br> Email: vithal_prabhu@</br> <br></br> प्रकाशक</br> अशोक केशव कोठावळे</br> मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस</br> न्यू गर्ल्स स्कूलसमोर, राम मारुती रोड</br> ठाणे (प.) - ४००६०२</br> Email: majesticph@gmail.com</br> <br></br> मुद्रक</br> मधुराज प्रिंटर्स ऍन्ड पब्लिकेशन्स् प्रा. लि.</br> स.न. २९/८-९ पारी कंपनीजवळ</br> धायरी, जि. पुणे-४११०४१</br> <br></br> संगणकीय अक्षरजुळणी</br> ऑलरिच एण्टरप्रायझेस</br> जी-८, सुमीत सदन</br> भागोजी कीर मार्ग, माहीम</br> मुंबई - ४०००१६</br> <br></br> मुखपृष्ठ : सतीश भावसार</br> <br></br> मूल्य : ₹२००<noinclude></noinclude> tsk4lvdfo5iv7y8tdr0doexyv5uvy6k पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/४ 104 111856 236078 2026-08-24T08:43:02Z ~2026-46135-33 6181 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "अनुक्रम दादर ........ मी डॉक्टर झालो १ २२ कॅलिडोस्कोप ५५ समाजजीवन १०० 'निरामय कामजीवन'ची गोष्ट ..... ११३ केल्याने देशाटन ....... १२७ नाटक झालेच पाहिजे!. १४८ सूर राहू दे. .......AS १६१ तीन" 236078 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>अनुक्रम दादर ........ मी डॉक्टर झालो १ २२ कॅलिडोस्कोप ५५ समाजजीवन १०० 'निरामय कामजीवन'ची गोष्ट ..... ११३ केल्याने देशाटन ....... १२७ नाटक झालेच पाहिजे!. १४८ सूर राहू दे. .......AS १६१ तीन<noinclude></noinclude> 1eh6vwy7rfzyoj8jzwnb5qjosk18xaj पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/५ 104 111857 236079 2026-08-24T08:43:42Z ~2026-46135-33 6181 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "दादर - दादर - मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थित्यंतरांचे आगर चळवळी आंदोलनांचे उगमस्थान. संगीत, नाट्य, क्रीडा, साहित्य यांचे माहेरघर. नामवंत, क..." 236079 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>दादर - दादर - मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थित्यंतरांचे आगर चळवळी आंदोलनांचे उगमस्थान. संगीत, नाट्य, क्रीडा, साहित्य यांचे माहेरघर. नामवंत, कीर्तिवंतांची कर्मभूमी. खरेदीदारांचे नंदनवन. आताच्या 'सेंट्रल रेल्वे'ला पूर्वी 'जीआयपी रेल्वे' व 'वेस्टर्न रेल्वे' ला 'बीबीसाय रेल्वे' म्हणायचे. या रेल्वे लाइनने दादरचे 'पूर्व' व 'पश्चिम' असे दोन विभाग केलेले असले तरी दादर म्हटले की, पश्चिम दादर असे गृहीत धरले जायचे. अशा या दादरच्या दक्षिण टोकाला म्हणजे गोखले रोड (दक्षिण) जेथे संपतो व 'रवींद्र नाट्यमंदिरा'पासून परळ नाक्यापर्यंत धावणारा सयानी रोड त्याला काटकोनात जुळतो, तेथे पंचवीस वर्षे राहिलो. त्यानंतर दादरच्या उत्तर टोकाला म्हणजे 'हरी निवास'च्या नाक्यावर राहायला आलो. इथे आलो त्याला पन्नास वर्षे होऊन गेली. घडलो, वाढलो दादरला. शिक्षण, संस्कार दादरमधले. बालपण, शैशव, तारुण्य आणि त्यानंतर ओघाने येणारे ज्येष्ठ नागरिकत्व हे सर्व दादरच्या कुशीतच घडले. मी दादर सोडले नाही व दादरने मला सोडले नाही. या दादरने आम्हाला खूप काही दिले. या दादरने खूप काही पाहिले, खूप काही सोसले. अतिरेकी हल्ले पचवले, ढगफुटी पाहिली, वादळे सोसली. धरणीकंप पचवले, राजकीय पक्षांचा जन्म पाहिला. 'चले जाव' आंदोलन, स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, इंग्रजांची गुलामगिरी व स्वातंत्र्याचा जल्लोषही अनुभवला. त्यानंतर झालेला अपेक्षाभंगही सोसला. दादरमधल्या वाड्या गेल्या व सोसायटीच्या इमारती आल्या. भाजीचे मळे, मोटा, विहिरी, नारळांची झाडे, झोपड्या गेल्या. एकत्र कुटुंबपद्धती गेली व विभक्त कुटुंबपद्धती आली. चाळ संस्कृती गेली व फ्लॅट संस्कृती आली. यातले चांगले काय, वाईट काय, हे ठरविण्याऐवजी ते दिवस कसे होते, यासंबंधीच्या आठवणी सांगणे हा मुख्य उद्देश आहे. दादर । १<noinclude></noinclude> 1zs5pswa07s2y4z6napyc7w5cqffmbu पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/६ 104 111858 236080 2026-08-24T08:44:03Z ~2026-46135-33 6181 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "त्या काळात दादरचे रस्ते मातीचे होते. भल्या पहाटे पाण्याची टाकी असलेली बैलगाडी यायची. पाण्याच्या टाकीला मागच्या बाजूला एक आडवा, भोके असलेला पाइप असायचा. गाडीच्या चालकाने दोरी ओढ..." 236080 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>त्या काळात दादरचे रस्ते मातीचे होते. भल्या पहाटे पाण्याची टाकी असलेली बैलगाडी यायची. पाण्याच्या टाकीला मागच्या बाजूला एक आडवा, भोके असलेला पाइप असायचा. गाडीच्या चालकाने दोरी ओढली, की पाइपच्या भोकांतून पाणी बाहेर पडायचे, रस्ता ओला व्हायचा. तो मृद्गंध आता अनुभवाला येत नाही. उन्हाळ्यात माणसे फूटपाथवर झोपत. फूटपाथ हवेशीर असल्यामुळे छान झोप लागायची! घरात पंख्याची गरज नसे. समुद्रावरून येणारा वारा वाटेत कुठेही न अडखळता सरळ घरात घुसायचा. बहुतेक चाळी बैठ्या किंवा एकमजली. पहाटे पाचला हॉटेल उघडायचे. चहाचा पहिला कप भुतासाठी रस्त्यावर फेकला जाई. विड्या ओढून छातीचा खोका झालेल्या दमेकऱ्यांचा खोकण्याचा आवाज किंवा 'पाण्या निघाली गौळण' या गाण्याच्या ओळीव्यतिरिक्त सर्व काही शांत असायचे. सकाळी सहा-सातनंतर रहदारी चालू होई. 'याss कल्हऽऽई' ही कल्हईवाला आल्याची खूण असायची. 'केरबाऽऽ माऽऽणि केरबा' म्हणत एक ढेरपोट्या मिशीवाला इराणी रस्त्यावर फिरायचा. दृष्ट लागू नये म्हणून आया आपल्या मुलांच्या गळ्यात ही पिवळ्या मण्यांची माळ घालायच्या. कधी दारावर अर्धी लुंगी व छातीभर काळ्या दोराची गुंडाळी बांधलेले 'नाथपंथी' 'यायचे; तर कधी 'जोगवा' मागण्यासाठी दाढी, टक्कल असलेला, साडी नेसणारा माणूस येई. 'हा बाप्या की बाई' हे कोडे असे. कधी बारक्या डोळ्यांचा, पाठीवर कापडाचे बोचके घेतलेला चिनी कापड विक्या येई. आंब्यांच्या दिवसांत 'साक्कर गोट्टी' ओरडत गावठी आंबे विकणारा येई. दिवेलागणीच्या वेळी बंडी घातलेला एक माणूस हातात लांब काठी घेऊन पळत रस्त्यावरचे दिवे पेटवीत जायचा. रात्री आठ वाजले की, 'ओपनिंगेऽऽ' असे ओरडत जाणारा माणूस दिसे. त्यानंतर सर्व काही सामसूम होई. रस्त्यावरील वाहने म्हणजे नाक्या-नाक्यावर उभी असलेली 'व्हिक्टोरिया' नावाची घोडागाडी व दर वीस ते तीस मिनिटांनी येणारी 'बीईएसटी'ची बस. या बसचे 'ए', 'बी', 'सी', 'डी' असे रूट असायचे. गोखले रोडवर 'एफ' रूट यायची आणि प्रभादेवी, टिळक ब्रिजवरून शीवपर्यंत 'जे' रूट जायची. भाडे दोन आणे. व्हिक्टोरियाने दादर स्टेशनला जायला चार आणे भाडे घेत. हे फार जास्त वाटायचे. व्हिक्टोरियाच्या मागच्या दांडीला लोंबकळून कधी कधी आम्ही शाळेत जात असू. हे बघणारे 'गाडीवाले पिछाड़ी चाबूक' असे ओरडायचे. गाडीवाल्याच्या चाबकाचा फटका बसेल, या भीतीने आम्ही मग व्हिक्टोरियाची दांडी सोडत असू. २ । गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> m90fi6vlxv38vgrgjxcv384122xfqew पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/७ 104 111859 236081 2026-08-24T08:44:37Z ~2026-46135-33 6181 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "त्याकाळी टॅक्सी नव्हती. पायी चालत जायचे; नाहीतर आगगाडी किंवा ट्रॅम ! आगगाडी दहा ते पंधरा मिनिटांनी यायची. मुलुंड-ठाण्याला जाणारी गाडी अर्ध्या तासानंतर यायची. बसायला नेहमी जागा मि..." 236081 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>त्याकाळी टॅक्सी नव्हती. पायी चालत जायचे; नाहीतर आगगाडी किंवा ट्रॅम ! आगगाडी दहा ते पंधरा मिनिटांनी यायची. मुलुंड-ठाण्याला जाणारी गाडी अर्ध्या तासानंतर यायची. बसायला नेहमी जागा मिळायची. फर्स्ट, सेकंड, थर्ड व इंटर असे चार क्लासेस असायचे. गिरगावात जायचे असल्यास परळला चालत जायचे व तेथून ट्रॅम पकडायची. एक आणा भाडे दिले की, ट्रॅममध्ये तासभर आरामशीर झोप घ्यायला माणूस मोकळा असायचा. गोगलगायीच्या गतीने जाणारी ही ट्रॅम रस्त्याच्या मध्यभागी धावायची. तिला हॉर्नऐवजी घंटा असायची. ट्रॅमचा चालक पायाने ठण्ठण् अशी घंटा वाजवीत रुबाबात ट्रॅम चालवायचा. या आवाजाची कानाला इतकी सवय झालेली की, रात्री ट्रॅम बंद झाल्यावर चुकल्यासारखे वाटायचे, असे परेलला राहणारे मित्र म्हणत. चाळीतील जुनी माणसे ट्रॅमोलला 'टमरेल' म्हणत. पूर्वी ट्रॅमला घोडे जोडलेले असत, असे ते सांगत. धान्य 'पायली' नावाच्या मापाने मोजायचे. दूध मापायचे 'छटाक', 'नवटाक' व 'शेर' या मापाने. सोळा छटाक म्हणजे एक शेर, हे इतकेच कोष्टक माझ्या लक्षात आहे. १ एप्रिल १९५७ पर्यंत एक रुपयाला सोळा आणे किंवा चौसष्ट पैसे मिळायचे. त्यानंतर एका रुपयाला शंभर नवे पैसे मिळू लागले. त्याकाळी 'चवली' (दोन आणे), 'पावली' (चार आणे) व 'अधेली' (आठ आणे) अशी नाणी होती. सत्तर वर्षांपूर्वी दोन आण्यांत जेवणाची थाळी मिळत असे. एकाने मला एकदा हिशेब विचारला, “एका आण्याला पंचवीस केळी, तर एका केळ्याची किंमत किती?" मला उत्तर माहीत नव्हते. त्याने उत्तर सांगितले, "एक रेस." मी 'रेस' हे नाणे पाहिलेले नाही. जुना पैसा, 'ढब्बू' (दोन पैसे), 'पै' (एक पैशाला तीन पै) व तीन दमडी (अर्धा पैसा ) पाहिली आहेत. - ते मंदीचे दिवस होते. नोकऱ्या मिळत नव्हत्या. रेशनिंग सुरू होईपर्यंत (सुमारे १९४०) स्त्रिया नोकरी करीत नव्हत्या. शिक्षणाचा प्रसारही नव्हता. सबंध चाळीत एखाददुसरा पदवीधर असायचा. पोरगा मॅट्रिक झाला की, डोक्यावरून पाणी गेल्यासारखे वाटायचे. महिना तीस रुपये पगार मिळविणारा सुखी व समृद्ध समजला जाई. एवढ्या पगारात एकत्र कुटुंबाचे भागत असे. मोठ्या भावाला कपडे तंग होऊ लागले; तर ते धाकट्या भावाने वापरायचे, मोठ्या भावाने शाळेची पुस्तके जपून वापरायची व पुढच्या वर्षी तो पास दादर । ३<noinclude></noinclude> 5b60ghrzsdy73vvi1lmeeg9laofha44 पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/८ 104 111860 236082 2026-08-24T08:45:02Z ~2026-46135-33 6181 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "झाल्यावर ती धाकट्या भावाला द्यायची, ही घराघरांतील रीत होती. निळ्या रंगाच्या दोन हाफ पैंटी व दोन पांढरे शर्ट यावर भागत असे. विजेचे बिल महिन्याला चार ते पाच आणे येत असे. बिल जास्त ये..." 236082 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>झाल्यावर ती धाकट्या भावाला द्यायची, ही घराघरांतील रीत होती. निळ्या रंगाच्या दोन हाफ पैंटी व दोन पांढरे शर्ट यावर भागत असे. विजेचे बिल महिन्याला चार ते पाच आणे येत असे. बिल जास्त येऊ नये यासाठी पंचवीस वॅटचा बल्ब लावीत असत व रात्री सर्वजण लवकर झोपी जात. आमच्या घरी वडिलांचे एक मामा येत असत. एकदा ते आले तेव्हा आम्ही दोघे भाऊ केस कापायला निघालो होतो. तेव्हा मुलांचे केस कापायला न्हावी तीन आणे घेई. मामा म्हणाले, "अरे, सहा आणे कशाला खर्च करता ? मी कापतो या मुलांचे केस. कात्री व फणी आणा." माझा पहिला नंबर लागला. (दादा शहाणा!) मामांनी माझे केस कापले. आरशात पाहिले, तर माझे संपूर्ण डोके उंदराने कुरतडल्यासारखे दिसत होते. डोकंभर केसांच्या पायऱ्याच पायऱ्या पसरल्या होत्या. मी रडत रडत आईकडे गेलो. आईलाही हसू आवरेना. शेवटी मी शेजारच्या न्हाव्याच्या दुकानात गेलो. तेथेही सर्वजण फिदीफिदी हसू लागले. न्हाव्याने त्या दिवशी तीन आण्यांऐवजी चार आणे घेतले. अशी ही आमची काटकसर! रस्ता ओलांडताना अपघात होईल, या भीतीने मी सात वर्षांचा होईस्तोवर मला घरच्यांनी शाळेत पाठवले नाही. मग एके दिवशी माझ्या मोठ्या भावासह मी म्युनिसिपालिटीच्या शाळेत गेलो. आम्हा दोघांना शाळेच्या ऑफिसात बोलावले गेले. "तुझ्या भावाची जन्मतारीख कोणती?" हेडमास्तरांनी दादाला विचारले. "मला माहीत नाही" - दादा उत्तरला. "ठीक आहे. वर्गावर जा." हेडमास्तर म्हणाले. त्यांनी रजिस्टरमध्ये माझी जन्मतारीख 'तीन जानेवारी' अशी लिहिली, ती आजवर तशीच अ. हे. ज्या हेडमास्तरांनी माझे बारसे केले, त्यांचे नाव लक्षात नाही. ते गोठ्या मिश्यांचे व सूटबूट घातलेले होते. बहुतेक ते वसईचे ख्रिश्चन असावेत. हेडमास्तर शिस्तीबाबतीत कठोर होते. मुलांच्या पायात चपला नसतील तरी चालेल, पण डोक्यावर टोपी हवीच. टोपी नसेल तर डोक्यावर छडी बसे. हेडमास्तर वगळल्यास इतर सर्व मास्तरांचा ड्रेस ठरलेला असायचा. धोतर, शर्ट, शर्टावर कोट, शर्टाची कॉलर कोटाच्या कॉलरवर बसवलेली आणि डोक्यावर काळी टोपी. कपाळावर उभे किंवा आडवे गंध. १४ | गोष्ट एका डॉक्टरची<noinclude></noinclude> b92w6r58pa0r5p3v60wv8ca0pceodyx पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६४ 104 111861 236083 2026-08-24T08:47:28Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236083 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कँडी व पेरेडॅनिया|५३ }}</noinclude>भाग लागला व लवकरच पेरेडॅनीया हे जंक्शन स्टेशन आले; पुण्याच्या शेतकी कॉलेजचे प्रो. सहस्रबुद्धे यांचे जुने विद्यार्थी ज्यांना त्यांनीं माझ्या लंकाप्रवासाबद्दल कळविलें होतें व ज्यांना मी आदल्या दिवशीं कार्डानें कोणत्या गाडीनें कँडीला जाण्याकरितां निघतों याबद्दल कळविलें होतें ते गृहस्थ रा. कंदिया हे अचानक माझ्या डब्यांत आले. त्यांच्या चौकस नजरेने पाहण्यावरून हेच रा. कंदिया असें मी ताडलें. मग पुढल्याच पेरडॅनिया बागेच्या स्टेशनवर त्यानी मला उतरून घेतलें व आपल्या बंगल्यावर नेलें. या प्रमाणें माझी कँडीला न जातां राहण्याची सोय झाली. मी कंदिया यांचे येथें पांच दिवस राहिलों. त्या चार पांच दिवसांत पाहिलेल्या प्रेक्षणीय स्थळांचे वर्णनास आतां लागणें बरें.<Br>{{gap}}रा. कंदिया हे पेरेडॅनिया बागेजजीकच राहत असल्यामुळे प्रथम आम्ही पेरेडॅनिया बाग पाहिली. मी या बागेत तीनदां तीन तीन तास घालविले. यावरून या बागेच्या विस्तीर्णपणाची व सुबकपणाची सहज कल्पना करितां येईल. या बागेनें सुमारे दीडशे एकर जागा व्यापिली आहे. हिची उपस्थिति थेट लंडन मधल्या '''क्यु''' नांवाच्या वनस्पतिशास्त्रीय बागेसारखी आहे. ज्याप्रमाणें लंडनची '''क्युबाग टेम्स''' नदीच्या एका लांब दांड्याच्या चिमट्याच्या आकाराच्या वाकणांत बसविली आहे, त्याप्रमाणें पेरडॅनीया बाग '''महावेली''' गंगा नांवाच्या लंका बेटांतील सर्वांत मोठ्या नदीच्या चिंचोळ्या वाकणांतील जागेंत बनविली आहे. पायाच्या पावलाच्या आकाराचें विचित्र वाकण करून महावेली गंगा नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वहात जाऊन एकदम आग्नेय दिशेस (दक्षिण-पूर्वेस) वळून मग पूर्व दिशेने वहात गेली आहे. म्हणजे या बागेच्या पूर्व पश्चिम व उत्तर या दिशांस नदी आहे. दक्षिण दिशा मोकळी आहे. तिकडून बागेचें प्रवेशद्वार असून तेथून थेट सरळ रस्ता नदीनें केलेल्या आंगठ्यासारख्या टोकाला नेण्यांत आला आहे. या रस्त्याचे मधोमध मोठें वर्तुळ हिरव्यागार हरळीचें ठेविलें आहे. त्यांत तीन चार छोटे पाम लावले असून त्याचे सभोवतीं एक पायवाटेचें छोटे वर्तुळ केलें आहे. प्रवेशद्वारानें आंत गेल्याबरोबर<noinclude></noinclude> n14ovset3hnhm20w9gm47bnxxtrlsng पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६५ 104 111862 236084 2026-08-24T08:50:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236084 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५४ |लंकेचं वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>फुलझाडांचें व छोट्या पाम वृक्षांचें एक वर्तुळ मनुष्याचें लक्ष वेधतें. समोर लांबच लांब पांढऱ्या शुभ्र रेतीचा रस्ता केला आहे. त्याचे दोन्ही बाजूंस वेलींनीं वेष्टिलेल्या वृक्षांच्या राजी लावल्या आहेत. त्या वृक्षांच्या खांद्यांनी त्या सर्व रेतीच्या रस्त्याभर जणूं कांहीं कमानदार बोगदा बनविला आहे, असा प्रवाशांस त्या रस्त्याने जातांना भास होतो. या रस्त्यानें बागेत जाऊं लागलें म्हणजे बाग बनविणाऱ्या योजकाच्या रचना-कौशल्याचें कौतुक केल्यावांचून रहावत नाहीं. हा शीतल सावलीचा बोगदा टाकून पुढे यावें तो खुलेंच खुलें पण जिकडे तिकडे हिरवेंगार दिसणारे वर्तुळाकार मैदान लागतें. या वर्तुळाचे परीघावर लहानमोठे नानावृक्ष सतेज पानाफुलांनी डहुरलेले दृष्टीस पडतात. हे सर्व वृक्ष ही बाग पहावयास येणाऱ्या राजवंशीय प्रख्यात पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ लाविलेले असून त्या प्रत्येक वृक्षाचे बुंध्याशी पाहुण्याचें नांव व त्यांचे हस्ते वृक्ष लावल्या दिवसाची तारीख लिहिलेले फलक जमिनींत खोचून ठेवलेले दृष्टीस पडतात. या स्मारक वृक्षांचेही मोठे कौतुक वाटतें. हें वर्तुळ टाकून पुढें जावें तो ''''रायल पाम'''' नांवाची वृक्षराजी मनुष्याचें मन आकर्षण करून घेते. हे पामवृक्ष साहा साहा फुटांचे अंतरानें दुतर्फा लावलेले आहेत. या रस्त्यानें जाण्यास तब्बल पांच मिनिटे लागतात. हा वृक्षराजीनें अलंकृत केलेला रस्ता टाकला की बागेचें चिंचोळें टोंकच येते. येथून नदीपलीकडे जाण्यास होडी असून त्यानें नदीपलीकडील प्रयोगक्षेत्राला जातां येतें.<Br>{{gap}}एकदां मी सबंद बागेला फेरी घातली. नदीच्या तिन्ही बाजूंना अगदीं नदीकांठानें पायवाट ठेविली आहे; ती पायवाट सुमारें तीन मैलांची आहे; ती चालण्यास मला एक तास लागला. प्रवेशद्वाराकडून डाव्या बाजूने गेलं म्हणजे एक छोटासा तलाव लागतो. हा तलाव मात्र बागेच्या मानानें फार लहान वाटतो व अगदीं डबक्याप्रमाणे भासतो. यांत अर्थात् पाणवेली व कमलवेली आहेत. या तलावाचे बाजूनें पायवाट जाते तीच नदीकाठची पायवाट. या वाटेनें गेलें म्हणजे खोल पात्राच्या<noinclude></noinclude> c10gu8rwax6tjzbja27519nhylrdvtu पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६६ 104 111863 236085 2026-08-24T08:51:59Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ 236085 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br> {{center|'''पेरेडॅनिया बागेतील तालीपॉट पामची दुहेरी रांग.'''}} {{rh|नं. ४||पान ५४}} {{nop}}<noinclude></noinclude> kxyvxd26hq8jqmn7kn2nemteya3ofgm पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६७ 104 111864 236086 2026-08-24T08:58:33Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236086 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कँडी व पेरेडॅनिया|५५ }}</noinclude>व संथ प्रवाहाच्या महावेली गंगेचा मोठा मनोहर देखावा दिसतो. या वाटेनें जातांना नदीच्या कडेस बांबूचीं बेटे खुब लावलेलीं दृष्टीस पडतात. केवढे प्रचंड हे बांबू आहेत. त्यांना इंग्रजींत राक्षसी बांबू म्हणतात. हे बांबू साठ सत्तर फूट तरी उंच असतील! बांबूचें एक एक पेर आपल्या इकडील पितळी सरळ अधोली येवढें असेल. बांबू पोकळ असून फारच रुंद असल्यामुळें येथें फुल झाडाचें व इतर वृक्षांचे रोपे करण्याकरितां कुंड्याऐवजीं या बाबूंच्या एक एक पेराचा उपयोग करतात असे मला दिसून आलें; तसेंच बंगल्याच्या पुढील लोंबतीं फर्न झाडें व इतर वेली याच बांबूंच्या अर्ध्या कापलेल्या आडव्या पेरांमध्ये माती भरून त्यांत लावतात. अर्थात् हे राक्षसी बांबू गरीबांच्या झोपड्यांना वासे तुळया यांचे कामी उपयोगी पडतात हे सांगण्याची जरूरी नाहीं. येथें बांबूचे पुष्कळ प्रकार पहाण्यास सांपडले.<Br>{{gap}}या बागेच्या जागेची ही मौज आहे कीं येथें उंचसखल, सपाट व टेकडीवजा अशा निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी आहेत. यामुळे बागेच्या रचनेला मोठी विविधता आली आहे. वनस्पतीच्या बहुतेक वर्गांचे मासले या बागेंत मोठ्या व्यवस्थितपणें लाविले आहेत हें सांगणें नकोच. सारांश सर्व जगांतील वनस्पतींचें येथें जितें प्रदर्शन करून ठेवलेलें आहे असें वाटतें! फार दुर्मिळ असे वृक्ष पैदा करून येथें लाविले आहेत. उदाहरणार्थ ज्या झाडाच्या सालींपासून ऋषिकाळीं नेसावयाचीं वल्कलें करीत तें झाड येथें प्रवेशद्वाराचे नजीक लावलेलें आहे. त्याचें इंग्रजी नांव Antiaris Innoxid. याची बाहेरची साल काढून आंतली साल कुजविली म्हणजे विणलेल्या तागाच्या वस्त्रापेक्षां किंचित् खरखरीत अशी लांबरुंद साल निघते. त्याचीं वल्कलें करतां येतात. येथल्या वनस्पतिशास्त्र- विषयक संग्रहालयांत या सालीची केलेली तुमान व कुडतें मी पाहिलें. ती पाहून मला आश्चर्य वाटलें. खरोखरी आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेल्या कापडाप्रमाणे त्या सालीचे कपडे दिसत होते. हातालाही ते फारसे खरखरीत लागले नाहींत. येथें थेट मेणबत्तीसारख्या शेंगा येणारें '''मेणबत्ती झाड'''<noinclude></noinclude> 0azmubk0pmkuevajv3f7uli449b3ogk पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६८ 104 111865 236087 2026-08-24T09:02:39Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236087 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५६ |लंकेचं वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>पाहिलें; वानराच्या शेपटीसारखीं फुलें येणारे वृक्ष येथें दृष्टीस पडले; थेट तोफेच्या गोळ्यासारखीं येणारी फळें तोफगोळा झाडें (Cannontall tree) येथें नजरेस पडली, मुकुटासारखीं सोनेरी झालरीचीं फुलें येणारे व म्हणूनच नेपीलियन मुकुटवृक्ष (Napoleon crown tree) नांवाचे वृक्ष दिसले; थेट सर्पाच्या अंगासारख्या वाढणाऱ्या वेली या बागेत झाडावर चढतांना दृष्टोत्पत्तीस आल्या; मुळे जमिनीवर असून तीं दुरून थेट मगरासारखी दिसणारी रबराचीं व बदामाचीं झांडें या बागेंत पहावयास सांपडली; पानाचा छत्रीसारखा उपयोग करतां येण्यासारखी पानें असलेले पाम; पोथ्या लिहिण्याचीं ताडपत्री पानें असलेले पाम, दुहेरी जोड नारळ येणारे पाम; प्रवाशांना पानांतून पाणी पिण्यास पुरविणारे पाम असे नाना तऱ्हेचे पाम वृक्ष व त्यांच्या रायाच्या राया येथें पहावयास मिळाल्या; येथें '''रुद्राक्षाचे''' वृक्ष पाहिले; असें किती वर्णन करावें? या बागेंत निरनिराळे ताटवे व निरनिराळीं गृहें केलीं आहेत व त्यामध्यें निरनिराळ्या जातीच्या पण एका सामान्य गुणांच्या वनस्पती एके ठिकाणी लावलेल्या आहेत. उदाहरणार्थ, एके ठिकाणीं जगांतील सर्व प्रकारच्या मसाल्यांची झाडें व झुडपें एकत्र हारीनें लाविलीं आहेत; एका गृहामध्यें दुसऱ्या झाडावर होणारीं नाना आकाxचीं व नाना रंगाची फुलें येणारी '''ऑरचिड्स''' संग्रहित केलेलीं आहेत; एका गृहांत नाना तऱ्हेचीं फर्नस (सीतेचे केश) एकत्र जमविलीं आहेत; एका गृहांत सावलींत वाढणाऱ्या वनस्पती व वेली लाविल्या आहेत; एका गृहांत नानातऱ्हेचीं फुलझाडें संग्रहित केलीं आहेत; सारांश बहुरत्ना वसुंधरेप्रमाणें ही पेरेडॅनिया बाग आहे. वनस्पतिशास्त्रीय बागेंतील एक उत्तम बाग म्हणून या बागेची जगभर कीर्ति झाली आहे ती यथार्थ आहे असें ही बाग पाहिल्यानें मनाला पटतें.<Br>{{gap}}कँडीचा शेवटचा राजा '''श्री. विक्रमराजसिंह''' याला ब्रिटिश लोकांनी सन १८१५ मध्ये पदच्युत केलें. तेव्हां राजाच्या बागा व राजवाडें ब्रिटिश सरकारच्या हातीं आले. या ठिकाणीं त्या राजाच्या वेळेपासून बाग होती.<noinclude></noinclude> 2zwkjmfn03k29cscd328kqgmle8ciyb पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६९ 104 111866 236088 2026-08-24T09:05:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236088 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कँडी व पेरेडॅनिया|५७ }}</noinclude>त्याच जागीं शास्त्रीय पद्धतीवर बाग करण्याचें सन १८२१ मध्ये ठरलें. या बागेवर तेव्हांपासून किती तरी अधिकारी आले पण त्या सर्वामध्यें '''थ्वेट्स''' या वनस्पतिशास्त्रज्ञाची कारकीर्द चिरस्मरणीय झाली. सन १८४९ मध्ये या बागेच्या कामावर मुख्य अधिकारी म्हणून त्याची नेमणूक झाली व तो या जागेवर सतत तीस वर्षे होता. त्यानेंच या बागेला हल्लींचें सुंदर रूप दिलें. त्यानें सर्व लंका बेट फिरून निरनिराळ्या ठिकाणची झाडें आणून लाविलीं व त्यांची जोपासना व वाढ केली; त्यानेंच या बागेला वनस्पति-शास्त्रीय बागेचें स्वरूप दिलें व या बागेची कीर्ति जगभर पसरविली.<Br>{{gap}}मागें सांगितल्याप्रमाणें नदीच्या वाकणाचे ठिकाणीं पलीकडे जाण्यास होडी असून तिकडे या बागेचें प्रयोगक्षेत्र आहे. तें पहाण्यास मी एके दोन प्रहरी निघालों. येथला देखावा कांहींसा नरसोबाच्या वाडीसारखा वाटला. कारण जरी येथें नदी एकच आहे तरी तिचें वाकण इतकें तिकोनी आहे की एका नदीला दुसरी नदी येऊन मिळाली आहे कीं काय असा भास होतो. येथें प्रवाह जोराचा आहे. पण पात्र लहानच असल्यामुळे होडी तेव्हांच पलीकडे जाते. पलीकडे गेल्यावर प्रथम प्रयोगक्षेत्राच्या इमारती लागतात. तेथें काफी भाजून तयार करण्याकरितां एक एंजिन बसविलेले दिसले; तसेच तेथें नळीच्या पत्र्याप्रमाणें बनविलेले रबराचे पत्रे पाहिले. तेव्हां ते बनविण्याचें यंत्रही तेथें असले पाहिजे. नंतर आम्ही मळ्यांकडे व शेताकडे गेलों तों प्रथमतः आम्हांला काफीचीं खूब झाडें लागलीं. त्यांवर लहान मोठ्या काफीच्या फळांचे घोसचे घोस लोंबत असलेले दिसत होते. काफीची झाडें फार उंच वाढलेली नव्हतीं. दुरून त्यांचीं पानें व ठेवण करंजाच्या झाडाच्यासारखी भासली; मात्र या झाडांचीं पुष्कळ पानें तांबूस रंगाचीं होतीं. नंतर आम्हांला कोकोचा एक लांबच लांब मळा लागला. या मळ्याच्या मधून पायवाट गेली होती. हीं झाडें कॉफीच्या झाडापेक्षां जरा मोठीं होतात; त्यांची पानेंही कॉफीच्या पानापेक्षां जरा मोठीं व<noinclude></noinclude> agt2vjnt0cfuxerlrtvozcm8pm2hi5i पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७० 104 111867 236089 2026-08-24T09:07:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236089 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५८ |लंकेचं वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>लांबट असतात, मात्र तीं पुष्कळ तांबडसर रंगाची असतात. कित्येक झाडांवर कोकोचीं लाल फळंही दिसत होतीं. कोकोचें झाड व कोकोचे फळ हीं दोन्हीं दिसायला फार सुंदर आहेत यांत शंका नाहीं. हीं झाडें बरीच दाट लावतात. दुरून कांहीं अंशी आपल्या इकडच्या पेरूसारखीं कोकोचीं झाडे व कोकोची बाग दिसते असे मला वाटलें. एक पिकलेलें कोकोचें फळ माझ्या बरोबर आलेल्या विद्यार्थ्यानें तोडलें. "मी शेतकी शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे मला फळ तोडण्यास हरकत नाहीं" असे तो म्हणाला, तेव्हां आम्हीं तें फळ बिनदिक्कत फोडलें व चाखून पाहिलें. या फळामध्ये सीताफळासारख्या पण जरा कमी काळसर अशा बिया असतात व या बियांना लागून गीर असतो. गीर किंचित आंबटगोड लागतो. बिया वाळवून मग त्यांतून कोकोचें पीठ काढतात व मग तें किंचित् परतून त्याचा कोको किंवा चाकोलेट करतात. पुढे आम्हांला रबराचें मोठें अरण्य लागलें. या प्रयोगक्षेत्राच्या आवारांत मोठा एक डोंगर असून त्या सर्व डोंगरावरही रबराची लागवड केली आहे. पण त्या डोंगरावर आम्ही गेलों नाहीं; पुढे निरनिराळ्या जातीचे नारळ हारीनें अर्धवट पुरलेले. दिसले, कांहींतून कोम बाहेर येत होते. तेव्हां ही नारळीची रोपें तयार करण्याचें शेत आहे असें आम्हीं ताडलें. पुढें आम्हाला एक खोलगट खाचर लागलें. त्यांत भात लावलेलें होतें. इतकें पाहून झाल्यावर आम्ही दुसऱ्या एका वाटेने परत फिरलों. तेव्हांही एक रबराचा मळा लागला. व दुसरा तसल्याच मोठ्या झाडांचा मळा लागला. त्याच्या चिकापासून दोर करतात असें कळलें. याप्रमाणें हें प्रयोगक्षेत्र एका दृष्टीनें बागेपेक्षांही आश्चर्यकारक आहे. लंकाबेटामध्यें कितीतरी तऱ्हेच्या उपयुक्त झाडांची लागवड यशस्वी झाली आहे हे या प्रयोगक्षेत्रावरून दिसून आलें. लंकेत सोन्याच्या विटा आहेत असें मी लहानपणापासून ऐकत असे. त्या प्रत्यक्ष सोन्याच्या विटा मला या क्षेत्रामध्ये दिसल्या नाहींत खऱ्या पण सर्व जगभर ज्यांचा प्रसार झाला आहे अशा पेयांची पैदास करणारी<noinclude></noinclude> 95b1jw3pg9zgwen4dqll6c3efj77b5y पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७१ 104 111868 236090 2026-08-24T09:16:27Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236090 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||कँडी व पेरेडॅनिया|५९ }}</noinclude>झाडे व अर्वाचीन दळणवळणाच्या साधनांतील एक आवश्यक घटक उत्पन्न करणारे वृक्ष यांची मोठ्या प्रमाणावर लागवड करून लंका बेटांत सर्व जगांतून सोन्याच्या विटा पैशाच्या रूपानें याव्या अशी लंकेची सद्यःस्थिति झाली आहे ही गोष्ट हे क्षेत्र पाहून मनाला पटली यांत शंका नाहीं.<Br>{{gap}}कँडी शहर मी दोनदां- एकदां मोटारीनें व एकदां कँडीस्टेशनपर्यंत आगगाडीनं व पुढें पायीं चालत जाऊन पाहिलें. कँडी कोलंबोच्या मानानें फारच लहान शहर आहे. पेरेडॅनीया बागेपासून कँडी तीन साडेतीन मैल आहे. पेरेडॅनीयाकडून येणारा नवा रस्ता शहरामधून पश्चिमेकडून पूर्व दिशेनें जातो व तो थेट कँडीच्या सरोवराच्या बाजूनें बुद्धाच्या दंतदेवळापर्यंत सरळ जातो. कँडीचा हा एक मुख्य व मोठा रस्ता आहे. दुसरा उत्तरेस त्रिंकोमालीकडे जाणारा त्रिंकोमाली नांवाचा रस्ता आहे. या दोन रस्त्यांच्या दुतर्फा कँडीची सर्व वस्ती बसलेली आहे. दोन्ही रस्ते अगदी सरळ असून प्रशस्त आहेत व त्याचे बाजूस मोठमोठ्या इमारती व दुकानें आहेत. त्रिंकोमाली-स्ट्रीट तर सुतासारखा सरळ व किंचित् चढता असल्यामुळे फार दूरवर गेला आहे असे भासतें. त्यामुळे शहराचा हा भाग मोठा उठावदार दिसतो. शहराचे रस्ते स्वच्छ दिसले. घरें व बंगलेही रंगविलेले, नीटनेटके सुबक व बागबगीच्यांनी शोभायमान केलेले दिसले. पण कँडीशहराचा अद्वितीय अलंकार म्हणजे कँडी सरोवर होय.<Br>{{gap}}पेरडॅनीयाकडून येणारा प्रशस्त रस्ता सरळ सरोवराच्या डाव्या बाजूनें जातो. कोपऱ्यावर पिवळसर, केशरी रंग दिलेलें तीन मजली टोलेजंग क्कीन्स हॉटेल नांवाचें निवासस्थान लागतें. या निवासस्थानाला फारच नाक्याची जागा मिळाली आहे. दोन्ही बाजूंस कँडीमधील दोन मुख्य प्रशस्त रस्ते व समोरच तें लांबच लांब सरोवर व त्याचे पलीकडे गर्द झाडांनीं आच्छादिलेले उंच उंच डोंगर हा देखावा निवासस्थानी राहणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचें मन मोहून टाकणारा आहे यांत शंका<noinclude></noinclude> fbxm881sl06tzxgwbu8xeakse5on4bf