विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.17
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf
106
74682
236191
236126
2026-08-25T15:09:39Z
कल्पनाशक्ती
3813
236191
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

a4dlqrhedptdjd749mlnchcx2bq8sch
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७६
104
77602
236188
202223
2026-08-25T14:39:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236188
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>काही टिळकपंथीयानी मुंबईत एक मराठी दैनिक सुरू करायचं ठरविलं होतं. आता अशा दैनिकासाठी खाडिलकरांपेक्षा योग्य संपादक कोण मिळणार? खाडिलकरांनी आनंदाने होकार दिला.
{{gap}}९ मार्च १९२१ पासून त्यानी मुंबईतील नव्या दैनिकाची, 'लोकमान्य' ची संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. 'केसरी' पर्वानंतर काकासाहेबांच आता 'लोकमान्य' पर्व सुरू झालं. काही काळ, म्हणजे एक दोन वर्षे बरी गेली. मग मात्र व्यवस्थापनाशी त्यांचे मतभेद होऊ लागले, म्हणून वैतागून त्यानी 'लोकमान्य' सोडला.
{{gap}}दुसरीकडे त्यांच्या नाटकातील घोडदौडीला पण अचानक ब्रेक लागला! त्यांचे नवीन नाटक 'द्रौपदी' साफ पडलें. अव्वाच्यासव्वा खर्च केल्यामुळे आणि बालगंर्धवांच्या गलथान आर्थिक व्यवहारामुळे नाटकास मोठा फटका बसला, लेखक म्हणून त्यांचेकडेहि अपयशाबद्दल अंगुलीनिर्देश केला गेला, याचे त्याना मनस्वी दुःख झाले. लोकमान्यांसारखा गुरू गेला. त्याच सुमारास हरितात्यांसारखा वडिलांचे ठिकाणी असणारा ज्येष्ठ बंधू गेला म्हणून 'द्रौपदीच्या' अपयशाने त्यांचे ठायी थोडे नैराश्य आले. त्यामुळे मन नाट्यलेखनापासून किंचित् दूरच गेले.
{{gap}}'लोकमान्य' पत्र सोडल्यावर पुढे काय? हा प्रश्न अभा राहिला. वृत्तपत्रीय लिखाणाची अूर्मी त्याना गप्प बसू देईना. लोकजागृतीसाठी वृत्तपत्रलेखन करायची तर अिच्छा होती. पण कुणाची ताबेदारी त्याना नको होती, तसेच मत्सर करणारे सहकारी पण नको होते. अशा परिस्थितीत पर्याय एकच होता. तो म्हणजे स्वतःचेच वृत्तपत्र सुरू करणे. समाजात त्यांची स्वतःची अशी काही पुण्याअी होतीच. पाठीशी चाहते आपणहून गोळा झाले.

{{gap}}'लोकमान्य' सोडल्यावर अवघ्या महिनाभरातच ७ मार्च १९२३ रोजी त्यानी स्वतःचे वर्तमानपत्र सुरू केले.
{{gap}}त्याचे नाव 'नवाकाळ' (आजहि हे पत्र जोरात चालू आहे.) 'नवाकाळ' हे आता तिसरे पर्व सुरू झाले. पूर्वीचा अनुभव कामी आला. पहाता पहाता 'नवाकाळ' लोकप्रिय झाला. खप दिवसेंदिवस वाढू लागला. नवी कल्पना म्हणून साप्ताहिक "नवाकाळ" सुरू करण्यात आला. गांधीजी, टिळकांचेच धोरण राबवून स्वातंत्र्यलढा पुढे नेत आहोत अशीच काकासाहेबांची धारणा असल्याने त्यानी गांधीजींच्या नेतृत्वाची भलावण केली. त्यामुळे 'नवाकाळ' ने चांगलेच बाळसे धरले. अर्थात यात गांधीजींच्या लोकप्रियतेचाही भाग होता.
{{gap}}मन आता थोडे स्थिरचित्त झाले. ५-६ वर्षांच्या नाट्यलेखनसंन्यासानंतर<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.......................५२</noinclude>
cm93gm8nqci1arusc7a09oes6gk2ypf
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७७
104
77603
236189
202225
2026-08-25T14:55:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236189
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>काकासाहेबानी 'मेनका' नाटक लिहिले. १९२६ साली रंगभूमीवर आलेलें हे नाटक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला आले नाही. गांधीजींच्या मताचा प्रचार करता करता नाटकाची कलात्मकतेची बाजू लंगडी पडली होती!
{{gap}}'नवाकाळ' भरभराटीस येत असता मध्येच एकदम ठेच लागली! एखादं वृत्तपत्र जनमानसात लोकप्रिय होणे याचा दुसरा अर्थ होता सरकारी रोषास बळी पडणे.
{{gap}}१५ मार्च १९२९ रोजी काकासाहेबांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. एक वर्षांच्या तुरूंगवासाची त्याना शिक्षा झाली. या काळात त्यांची प्रकृती जी ढासळली ती कायमचीच. शारीरिक दृष्ट्या खचलीच पण आश्चर्य म्हणजे मानसिक दृष्ट्या जास्ती खचली. लो. टिळकानी बंदिवासाच्या जीवघेण्या एकांतवासाच्या काळात मनाचा कणखरपणा कणभरसुध्दा ढळू दिला नव्हता, याचे अप्रूप काकासाहेबाना आता फार जाणवले.
{{gap}}अिथं आणखी एक योगायोग आवर्जून सांगण्यासारखा आहे. काकासाहेबांच्या लेखांमुळे टिळकाना शिक्षा झाली होती. काकासाहेबाना ज्या लेखाबद्दल राजद्रोहाची शिक्षा झाली तो लेख त्यानी लिहला नव्हता. तो लिहिला होता दुसऱ्याच सहसंपादकाने. बहुधा न. र. फाटक यानी तो लिहिला होता अशी वदंता होती. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी!
{{gap}}तुरुंगवासातून आल्यानंतर काकासाहेबानी 'नवाकाळ' ची संपादकीय सूत्रेपण हाती घेतली नाहीत. आप्पा सगळं व्यवस्थित संभाळतोय हे पाहून सगळा कारभार त्यालाच सांभाळायला सांगितला. वास्तविक स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरु होती. मिठाचा सत्याग्रह जनतेने अपूर्व उत्साहाने अचलून धरला होता. सरकारी दडपशाही चालूच होती. अहिंसक प्रतिकार विलक्षण संयमाने चालू होता. अशावेळी काकासाहेबांची लेखणी एखाद्या तरवारीसारखी परजायला हवी होती. पण तसं का होत नव्हतं याचं सर्वानाच कोडं पडलं होतं. पुन्हा म्हणून त्यानी संपादकीय लेखणी हाती धरली नाही त्यांच्या आजवरच्या पत्रकारी जीवनातील ही न समजणारी शोकांतिका होती.
{{gap}}नाही म्हणायला त्यानी आपलं नाट्यलेखन चालू ठेवलं होतं, पण मेनका, सावित्री, सवतीमत्सर या सर्व नाटकांतून गांधीजींच्या तत्वज्ञानाचा प्रचार केल्यामुळे की काय ती नाटकं निष्प्रभ ठरली होती. टिळकयुगातील त्यांची एकूण तडफ, त्वेष, गांधीयुगात नाटकातूनही मावळला होता. त्यांच्या लाडक्या बालगंधर्वाच्या नाटकमंडळींची वाताहात झाली होती. एकूणच नाट्यव्यवसाय सिनेमाच्या आगमनाने ओहोटीस लागला होता.
{{gap}}आता काकासाहेबांचा ओढा अध्यात्माकडे लागला होता. सांगलीस ते अधूनमधून विश्रांतीसाठी येत. कृष्णानदीच्या काठावरील आपल्या मळीमध्ये त्यानी एक छोटसं<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...................................५३</noinclude>
bbs5ui73pjwqcy3803h5n4i8qrebykv
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७८
104
77604
236190
202228
2026-08-25T15:08:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236190
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>टुमदार दत्तमंदिर बांधून घेतलं. त्यामध्ये ते प्रवचन करू लागले. दत्तमंदिर बांधले त्यावर्षी सतत आठ महिने त्यानी प्रवचने दिली. १९३८ साली दरवर्षीप्रमाणे प्रवचने देण्यासाठी सांगलीस आले असताना, दत्तमंदिरातच फेऱ्या घालताना कोसळले. त्याना पक्षाघाताचा झटका आला होता. त्याचा परिणाम त्यांच्या वाचाशक्तीवर झाला, बोलणे अस्पष्ट होऊ लागले. अितकेच नव्हे तर मेंदूवर थोडा परिणाम होऊन शब्द आठवेनासे झाले.
{{gap}}दुर्दैवाचे भाले चारी बाजूनी रोखले जात होते. त्याना अर्धांगाचा झटका आला त्याच्या आदल्याच वर्षी त्यांची लाडकी सून, सौ. कमल (आप्पासाहेबांची पत्नी) गेली. नंतर नेहमी रुग्णाईत असलेला मुलगा विनायक गेला. जिने सर्व अडी- अडचणीतून दिवस काढले, नवाकाळ संकटात असताना आपले सर्व दागिने दिले, त्या सौ. गौरबाई अर्धांगाने खिळल्या. त्यांचा एक पाय कापावा लागला आणि अखेर १९४५ साली त्यांचे देहावसान झाले. हा आघात फार मोठा होता. त्या गेल्याचे कळल्यावर गांधीजी स्वतः काकासाहेबाना भेटायला आले. नुकत्याच कस्तुरबा वारल्या होत्या. गांधींजींचे मौन असल्याने काकासाहेबांचे सांत्वन करताना त्यानी लिहिलं, “आपण दोघे आता समदुःखी झालो."
{{gap}}१९४३ साली त्यांच्या लाडक्या सांगली गावात भरलेल्या विष्णुदास भावे या सांगलीच्याच आद्य नाटककाराच्या शतसांवत्सरिक अत्सवातही काकासाहेब आपल्या विकलांग अवस्थेमुळे जाऊ शकले नाहीत. या प्रसंगी त्यांचा मोठा सत्कार करण्याची सांगलीकर नाट्यप्रेमींची अिच्छा अपुरीच राहिली याचे मानसिक क्लेश त्याना स्वतःला किती झाले असतील!
{{gap}}अखेरीस २६ ऑगस्ट १९४८ रोजी काकासाहेब शांतपणे अनंतात विलीन झाले.
{{gap}}दुःखात सुख एवढेच की जी स्वातंत्र्याची सकाळ पाहण्यासाठी त्यानी आपली लेखणी-वाणी आयुष्यभर झिजवली, त्या स्वातंत्र्याची पहाटच नव्हे, तर सूर्योदयहि त्यानी पाहिला. आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाल्याचे मानसिक समाधान त्याना लाभले.
{{gap}}तिसरी घंटा झाली, आणि त्या झुंझार पत्रकाराच्या आणि प्रतिभावंत नाटककाराच्या जीवननाट्यावर अखेरचा पडदा पडला!
{{gap}}सांगलीच्या, त्यांच्या कृष्णाकाठच्या मळीतील दत्तमंदिरात, संध्याकाळी फिरत फिरत एखादा सांगलीकर नाट्यप्रेमी जातो तेव्हा त्याला सांगलीच्या या महान नाटककाराची आठवण येऊन, नक्कीच गहिवरून येत असेल!

{{center|●●●}}
{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.........................५४</noinclude>
scdlyyqndyq3nwbac3xpyktw8ry1opr
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७९
104
77605
236192
202381
2026-08-25T15:11:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236192
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{x-larger|'आधुनिक अेकनाथ' पारमार्थिक कीर्तनकार}}}}
{{center|{{xx-larger|संत कोटणीस महाराज}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}१८४३ साली कै. विष्णुदास भावे यानी 'सीतास्वयंवर' हे नाटक प्रथमतः रंगभूमीवर आणलं. त्यामुळे सांगली ही 'नाट्यपंढरी' म्हणून ख्यातकीर्त झाली. विसाव्या शतकाच्या प्रारंभानंतर काही वर्षातच, आणखी एका थोर सांगलीकरामुळे सांगली ‘कीर्तनपंढरी' म्हणूनही ओळखली जाऊ लागली.
{{gap}}हा श्रेष्ठ सांगलीकर म्हणजे ज्या गुरूदेव रानडे यानी त्यांचे वर्णन 'आधुनिक एकनाथ' असे केले आहे, ते संतश्रेष्ठ श्री तात्यासाहेब कोटणीसमहाराज!
{{gap}}वास्तविक प्रपंच आणि परमार्थ या दोहोंचे नाते छत्तीसच्या आकड्याप्रमाणे असते. प्रपंच करणारे अनेक असतात. परमार्थ करणारे तुलनेने थोडे असतात. पण प्रपंच साधून परमार्थ साधणारे महाभाग जवळजवळ नसतातच. जुन्या काळात जसे या दोहोची सांगड घालणारी एकच एक थोर व्यक्ती म्हणून, फक्त संत एकनाथमहाराजांकडेच बोट दाखवता येते, तसे आधुनिक काळात असे सर्वमान्य व्यक्तिमत्व, म्हणजे संतश्रेष्ठ श्री तात्यासाहेब कोटणीसमहाराज!
{{gap}}तशी सांगली ही भाविकांची भूमीच आहे. सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याचे जे मूळ पुरूष हरभट, त्यांची अनन्यसाधारण भक्ती पाहून श्रीगजाननाने सांगलीत कायमस्वरूपी निवास केला आहे, असं सर्वसामान्य भाविकाला वाटतं. श्री रामानंदमहाराज खटावकर, त्यांचे परात्पर गुरु श्री सदाशिवमहाराज, बाबासाहेब मुजुमदार, सत्यव्रततीर्थ मौनीबाबा, श्री आनंदमूर्ती, कृष्णा परीट, अप्पाराव पोवार, अण्णाबुवा, धोंडिराममहाराज, श्रीनारायणमहाराज मळणगावकर, अवधूत संप्रदायी श्री ताम्हनकर महाराज ही सारी सांगली परिसरातील संतमंडळी. या सर्वानी जी भक्तिमंदिराची वास्तू अभी केली, तिला कळसावर नेले ते तात्यासाहेबानी. सतत दोन तपे म्हणजे २४ वर्षे अखंड कीर्तन करणे हाच एक चमत्कार आहे. महिनाभर कीर्तन करायचं म्हटलं की किती त्रास होतो ते त्या कीर्तनकारालाच ठाऊक. तेव्हा अशी कीर्तने अखंडपणे, तेहि ठराविक वेळी, प्रकृतीची तमा न बाळगता करणे, ही किती अवघड गोष्ट! पण अशी ही साधना वर्षानुवर्षे, श्रीएकनाथांप्रमाणे स्वतःच प्रसादाचा, तेलबत्तीचा खर्च करून<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.............................५५</noinclude>
btjgdvq5r226j18hl3ln52u3kia6g4e
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८०
104
77606
236193
202382
2026-08-25T15:21:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236193
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>कोटणीसमहाराजानी केली. सामान्य संसारी जनांना भक्तिमार्ग विशद करून आत्मिक समाधानाच्या पदपथावर नेले.
{{gap}}अशा या हणमंत पांडुरंग तथा तात्यासाहेब कोटणीस यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६४ रोजी सांगली संस्थानातील तेरदळ या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. कोटणीस घराणे हे पुरातन काळात 'नाईक-वडेर' या अपनावाने कर्नाटकातील केरूर गावात सुप्रतिष्ठित होते. विजापूर बादशहाच्या मूळ चाकरीत असलेले त्यांचे पूर्वज १७४६ च्या सुमारास विजापूर सोडून मुधोळ येथे स्थायिक झाले. मुधोळकर संस्थानिकानी या पूर्वजांना वाड्यातील 'कोटणिशी' (कोठीवरचे अधिकारी) दिली. मूळ हुद्दा कोठीनवीस किंवा कोठीनीस असा आहे. पण दोन्ही शब्द अुच्चार करण्यास कठीण म्हणून लोक कोटणीस म्हणत. अशा तऱ्हेने ही मूळची नाईक- वडेर मंडळी 'कोटणीस' म्हणूनच ओळखली जाऊ लागली.
{{gap}}तात्यांचे प्राथमिक शिक्षण मुधोळ येथे झाले. त्यांचे वडील पांडुतात्या यांचं निधन, तात्या १३ वर्षाचे असतानाच झाले. तेव्हा त्यांचे संगोपन त्यांचे पित्यासमान असलेले चुलते वामनकाका यानी मोठ्या ममतेने केले. पितृछत्र हरपल्याची बिलकूल जाणीव होऊ दिली नाही. चुलत्या-पुतण्याचे संबंध विलक्षण प्रेमाचे होते. अध्यात्मक्षेत्रात या जोडीचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. तात्यांच्या शालेय जीवनात दोन-तीन शिक्षक त्याना चांगले लाभले. पंडित दादाचार्य राघवाचार्य कट्टीशास्त्री यांजकडे त्यांचे संस्कृत अध्ययन झाले. नंतर वेदान्तावर 'ब्रह्मसिध्दांतमाला' नामक पुस्तक लिहणारे अद्वैतपंडित बाबा गर्दे त्याना शिक्षक म्हणून लाभले. त्यामुळे अनेक संतकवींच्या रचना तात्यांना विद्यार्थीदशेतच तोंडपाठ झाल्या होत्या. इंग्रजी विषयाची त्याना गोडी लागली, म्हणून त्यानी इंग्रजीचे मनापासून अध्ययन केले. इतके की त्यांचे इंग्रजी बघून पुढे मिरज हायस्कूलमधील त्यांचे संस्कृत शिक्षक, तात्यांचे, इंग्रजीचे विद्यार्थी बनले! बरे, हे संस्कृत शिक्षक कोणी सामान्य पुरूष नव्हते. ते होते प्रख्यात इतिहास-संशोधक, नाटककार म्हणून अभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले वासुदेवशाश्त्री खरे! मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तात्यांना मुधोळ संस्थानची दरमहा आठ रूपयांची शिष्यवृत्ती मिळत असे. १८८२ मध्ये ते मिरज हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. पुढे शिकण्याची अत्कट अिच्छा होती. पण पितृछत्र हरपलेले. एकत्र कुटुंब- पध्दतीमुळे कोटणीस कुटुंबियांचा बारदाना मोठा. घरावर कर्जाचा भार. त्यातच त्या काळच्या रीतीनुसार १७ व्या वर्षीच त्यांचे लग्न झालेले. तेव्हा आपल्या आदरणीय वामनकाकांच्या खांद्यावरचा भार हलका करण्याच्या दृष्टीने, तात्याना नोकरी करणे क्रमप्राप्त होते. संस्थानची शिष्यवृत्ती घेतली असल्याने, मुधोळ संस्थानची नोकरी<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.............................५६</noinclude>
hr5pk5mj6ye0hjy6cwah8gxjs78x559
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८१
104
77607
236194
202383
2026-08-25T15:27:36Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236194
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>करणे बंधनकारक होते. तेव्हा २० रू. पगारावर त्यांची नोकरी सुरु झाली. लवकरच त्यांची हुशारी, निलोंभी वृत्ती आणि तरतरीतपणा पाहून, श्रीमंत व्यंकटराव घोरपडे यानी त्याना आपल्या खाजगीकडे घेतले. तथापि संस्थानी राजकारण म्हणजे हेवेदावे, मत्सर, एकमेकांचे पाय ओढणे या गोष्टींचा वाईट अनुभव तात्याना यायचा होता.
{{gap}}आणि थोडीशी गमतीची गोष्ट म्हणजे ज्या सत्संगाचा सदोदित लाभ व्हावा म्हणून तात्या आयुष्यभर धडपडले, त्या सत्संगाची सुरवात होतानाच त्याना त्रास झाला. किंवा थोडक्यात तशी त्यांची परीक्षाच झाली. झालं ते असं.
{{gap}}मुधोळ संस्थानातील मॅजिस्ट्रेटच्या हुद्यावर असलेले श्री. बाबासाहेब मुजुमदार (तात्यासाहेबांचं रसाळ चरित्र लिहणाऱ्या साधुदास तथा गोपाळराव मुजुमदार यांचे चुलते) आपल्या पाच-सहा सहकाऱ्यांसमवेत मुधोळजवळ असलेल्या चिमड मठात जात आणि सोमवारी नोकरीवर हजर होत. मच्छिंद्रगोरक्षादी नवनाथापैकी श्रीरेवणनाथ हे ज्या गुरूपरंपरेचे आद्य पुरुष मानले जातात, अशा ज्ञानशाखेचे एक पीठ चिमड येथे होते. तेथे त्यावेळी श्रीमत् रामचंद्रमहाराज यरगट्टीकर मठाधिपती होते. तसेच तात्याना पुढील आयुष्यात ज्या अत्यंत आदरणीय आणि मार्गदर्शक ठरल्या, त्या लक्ष्मीअक्कामहाराज या महाराजांच्या गुरुभगिनी पण तेथेच होत्या. अध्यात्मिक मनोवृत्तीच्या तात्याना ही पर्वणीच होती. या महाराजांचा आपल्यालाही गुरूपदेश मिळावा, ही आस त्याना लागली. म्हणून ते बाबासाहेबांबरोबर चिमडला जाऊ लागले. अवघ्या २२ व्या वर्षीच त्याना गुरुपदेश मिळाला. अशी एका बाजूने त्यांची अध्यात्मिक प्रगती होत होती. त्याचवेळी मुधोळ दरबारात "आता हणमंतरावजी कोटणीस भलत्याच(?) मार्गाला लागलेत. कामाकडे त्यांचे लक्ष नाही. गुरुबाजीला बळी पडले आहेत. वगैरे वगैरे.” अशा तऱ्हेच्या कागाळ्यांमुळे त्याना नोकरीत अपमान आणि मनःस्ताप सोसावा लागला. मुन्सफ असलेले तात्या, शिरस्तेदार म्हणून खाली घसरले. त्याहून मानभंग म्हणजे तो चार्ज घेत असतानाच अमुक अेका कारकुनास शिरस्तेदार पद देऊन, आपण स्वतः त्याचेकडील कारकून म्हणून काम करावे असा हुकुम झाला! अखेर नोकरी कायम सोडण्याचा मनोमन निश्चय करुन, तात्यांनी एक वर्षांच्या बिनपगारी रजेचा अर्ज पाठवून दिला.
{{gap}}एका दृष्टीने ही अिष्टापत्ती ठरली. कारण ज्या वकिली व्यवसायाने त्याना आयुष्यात स्थैर्य दिले, अनेक गोष्टी मनासारख्या करायला मिळाल्या, त्या वकिलीच्या परीक्षेसाठी त्यानी कंबर कसली.
{{gap}}मात्र दरम्यानचा काळ फार हलाखीचा होता. सर्व चुलते मंडळी वयस्क झालेली. धाकटी सख्खी चुलत भावंडे शिक्षणाची, घरात वीस-पंचवीस मंडळींचा<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..............................५७</noinclude>
83cbhz95rqeg6vgzmj9h3eyyy2445u0
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८२
104
77608
236195
202384
2026-08-25T15:30:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236195
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>कुटुंब- कबिला. यामुळे संसाराचा गाडा ओढता ओढता तात्यांची दमछाक होऊ लागली. आपल्या अल्प वेतनात निर्वाह होत नाही. कर्जाचा बोजा वाढत चाललेला. या गोष्टी त्याना क्लेशकारक होत. आपली प्राप्ती वाढवावी या हेतूने त्यानी हायकोर्ट- प्लीडरच्या परीक्षेला बसण्याचे प्रयत्न केले. पण अभ्यासाला आवश्यक पुस्तके, बिकट आर्थिक परिस्थितीने घेता येत नाहीत, मनःस्वास्थ्य नाही, अशा कारणाने त्याना मुंबईत जाऊन परीक्षा पदरात पाडून घेण्याचे काही जमेना. त्या काळी सांगली संस्थानात स्टेट प्लीडरच्या परीक्षा होत. त्याला बसायचे तात्यानी ठरवले. सुदैवाने त्याना यश मिळाले. तेव्हा तात्यानी सांगलीत वकिली सुरू केली. कर्मधर्मसंयोगाने त्याचवेळी, त्यांचे परिचित आणि चिमडच्या महाराजांचा अनुग्रह मिळवून देण्यास कारणीभूत असलेले, महाराजांच्या सांप्रदायिकापैकी, वर अुल्लेख आलेले बाबासाहेब मुजुमदार सांगलीतच वकिली करत होते. त्यांच्यामुळे तात्याना कामे मिळू लागली. आणि यापेक्षा मोठा फायदा म्हणजे कायद्याची पुस्तके आणि मोलाचे मार्गदर्शन त्याना बाबासाहेबांकडून मिळू लागले. तात्यांची अमेद वाढली. त्यानी फिरून एकवार डिस्ट्रिक्ट प्लीडरच्या परीक्षेसाठी मुंबईला जायचे ठरविले. या खेपेस मात्र त्याना यश लाभलं. आत्मविश्वास दुणावला. सांगलीपेक्षा बेळगावसारख्या मोठ्या ठिकाणी जाऊन वकिली करावी, असे त्यांच्या मनाने घेतले. त्याप्रमाणे १८९३ ते १८९७ या काळात त्यानी बेळगावला बिऱ्हाड केले. स्वतंत्र वकिली व्यवसाय करावा. त्यात प्रयत्नपूर्वक प्रगती करत अुत्कर्ष साधावा. द्रव्य संपादन करावे ते घराण्याचे कर्ज निवारून, साऱ्या कुटुंबाची अुर्जितावस्था साधण्यासाठी. हे हेतू पूर्ण होत असल्याने, बेळगाव हीच त्यांची पुढील आयुष्यात कर्मभूमी झाली असती. पण नियतीची तशी अिच्छा नसावी. त्यांच्या पत्नीला, बेळगावच्या हवेचा त्रास होऊ लागला. हवापालट म्हणून तेरदाळला राहून बघितले. तरी काही फरक पडेना. प्रख्यात धन्वंतरी आबासाहेब सांबारे यांच्या नजरेसमोर औषधोपचार करायचे, तर सांगलीतच राहायला हवे. म्हणून १९०० सालच्या एप्रिलमध्ये त्यानी सांगलीतच बिऱ्हाड थाटलं.
{{gap}}मध्यंतरीच्या काळात खुद्द तात्यांवरच एक जिवावरचे दुखणे ओढवले. अचानक भूक मंद मंद होऊ लागली. अंगास जडपणा येऊन चेहऱ्यावर फिकट छटा दिसू लागली. सांगलीचे स्नेही आबासाहेब सांबारेना दाखवून औषधोपचार चालू होता. पण वैद्यराज सांगलीत आणि रुग्ण बेळगावात. मग गुण कसा यावा? बरं, आबासाहेबानी निक्षून सांगितले होते की खडखडीत बरे व्हायचे असल्यास, सांगलीत येऊन राहणे आवश्यक आहे. हेळसांड झाल्यास अवघड आहे. कारण रोगाचे स्वरूप गंभीर आहे. या दुखण्याने तात्या एवढ्या जेरीस आले की या आजारातून आपण काही अुठत नाही, असेच त्यांच्या मनाने घेतले. मग एवीतेवी देहत्याग करायचा तर मग तो<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...............................५८</noinclude>
738i3x5oszjf0leyh6lajpofy48jvbq
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८३
104
77609
236196
202385
2026-08-25T15:34:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236196
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आपल्या प्राणप्रिय चिमडला जाऊन का करू नये? म्हणून ते चिमडला मोठ्या कष्टाने प्रवास करत आले. मठाचे प्रवेशद्वारीच, साध्वी लक्ष्मीआक्का त्याना अुतरवून घेण्यास आल्या होत्या. नगाऱ्यासारखे झालेले पोट, तटाटलेल्या शिरा-धमन्या, हातापायास सूज येऊन सर्वांगावर पसरलेली पिवळसर छटा, अशी एकूण तात्यांची करुणास्पद स्थिती बनली होती. तेव्हा लक्ष्मीआक्कानी "भिऊ नको. साधुमहाराज तुला बरं करतील” असं म्हणून धीर दिला. त्या देतील तो तीर्थप्रसाद हाच रोगोपचार समजून ते एकेक दिवस ढकलत राहिले. एकवीस दिवस एकान्तवासात काढल्यावर संडासमार्गे दोन हात लांबीचा सर्प बाहेर पडला आणि व्याधिमुक्ती झाली. अुदरव्याधीतील हा प्रकार म्हणजे सर्पोदर होता. महाराजांच्या कृपाप्रसादामुळे आणि लक्ष्मीअक्कांच्या शुश्रुषेनेच प्राणसंकट टळले, अशीच सर्वांची भावना झाली. चिमडच्या मठाबद्दल तात्यांच्या मनात एवढे ममत्व आणि श्रध्दा होती की पुढील आयुष्यात जे जे शक्य होते ते सर्व त्यानी चिमडच्या मठासाठी केले. सद्गुरू रामचंद्रमहाराजांवर त्यांची नितांत श्रद्दा होती. ते एकदा मुधोळला आले होते तेव्हा सर्व भक्तांसमक्ष तात्यानी आपला सगळा पगार गुरूमहाराजांपुढे दक्षिणा म्हणून ठेवला! त्यांच्या आर्थिक दुःस्थितीची महाराजांना जाणीव होती. म्हणून ते म्हणाले. "बाबा रे, सारा पगार दिल्यावर तुम्ही मंडळी काय खाणार?” मग महाराजांनी साधुबुवांचा प्रसाद म्हणून दोन रूपये तात्यांच्या हातावर ठेवले. आणि म्हणाले. "हा प्रसाद म्हणून जतन करून ठेव म्हणजे तुला काही कमी पडणार नाही." पराकोटीची श्रध्दा कशी असते ते पाहा. ते दोन रूपये आजहि कोटणीस घराण्यात जपून ठेवलेले आहेत!
{{gap}}श्रीगुरूंच्या आणि लक्ष्मीअक्कांच्या हाताच्या अमृतस्पर्शाने पावन झालेली प्रत्येक वस्तू तात्यांना परमपवित्र असे. अेकदा वाहन वेळेवर न मिळाल्याने तात्या चिमडच्या मठात अवेळी पोचले. रात्रीची स्वयपांकघरातील सामसूम बघून आणि आपल्या एकूण भिडस्त स्वभावानुसार "भोजन झाले आहे" असे बळेच त्यानी सांगितले. एकूण ‘प्रकार' लक्षात आल्यामुळे लक्ष्मीअक्कानी झाकून ठेवलेली कोरभर भाकरी शोधून तात्याना दिली. प्रेमाने दिलेला तो भाकरीचा तुकडा अद्यापहि कोटणीसांच्या वास्तूत सुरक्षित आहे!
{{gap}}अनुग्रह झाल्यावर गुरूमहाराज आणि तात्या मठाच्या अंगणात अुभे होते. तेव्हा आपल्या जीर्ण झालेल्या सोप्याकडे बोट दाखवून महाराजानी अकस्मात विचारले "हणमंतराव, तू ही इमारत आम्हाला चांगली बांधून देशील काय?" तेव्हा तात्या म्हणाले, "महाराज, माझी विपन्नावस्था आपणास ठाऊक आहेच. तथापि आपली कृपा होईल तर नक्कीच ही अिमारत बांधून काढेन." त्यावर महाराज मंद हसले. पण<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................५९</noinclude>
ebmo9qalp7w3yaf4d4vbecyql89nny8
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८४
104
77610
236197
202386
2026-08-25T15:38:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236197
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>त्यांच्याच कृपेने संपन्नता आल्यावर खरोखरीच तात्यानी आपला शब्द खरा केला!

{{gap}}चिमड मठाच्या सोयी-गैरसोयी, रथोत्सवासारखे अुत्सव या सर्व प्रसंगी अत्यंत पवित्र भावनेने तात्यानी चिमड- मठाची निरपेक्ष सेवा केली. आयुष्याच्या अखेरीस देहत्यागसुध्दा चिमडलाच करावा अशी त्यांची अिच्छा होती. पण तसा योग नव्हता! असो.
{{gap}}बेळगाव-तेरदाळ सोडून तात्या सांगलीत आले. त्यानंतर सर्व चित्रच पालटले. सांगलीत आल्यापासून त्यांच्या अुत्कर्षाची कमान अखेरपर्यंत चढतीच राहिली. आजवरचे त्यांचे जीवन हे एखाद्या गृहस्थाश्रमी सज्जनाचं असावं तसं होतं. आजमितीला तात्यांची जी 'प्रतिमा' सर्वज्ञात आहे, त्याची जडणघडण सांगलीच्या या वास्तव्यात झाली. यापुढील काळात तात्यासाहेब कोटणीस यांचे घर, त्यांची वकिली, व्यवसायातील मिळकत, त्यांची कीर्तन-प्रवचने हा रंजल्या-गांजल्या माणसांसाठी मोठाच निवारा ठरला.
{{gap}}एक अत्यंत सदाचरणी, हुषार आणि यशस्वी वकील म्हणून सांगलीत स्थायिक झाल्यानंतर, थोड्याच काळात त्यांचा बोलबाला झाला. कोर्टात अकराच्या ठोक्याला ते बिनचूक हजर असत. मग जज्साहेब येवोत न येवोत! प्लेगच्या अुपद्रवामुळे सांगली सोडून कवलापूर, बुधगावच्या माळावर वस्तीला जावं लागलं, तरी त्यांच्या नियमितपणाला बाधा येत नसे. कायद्याचा सखोल अभ्यास आणि स्तिमित करणारी स्मरणशक्ती, ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आपल्या पक्षकाराची बाजू ते पूर्णपणे समजावून घेत त्याचवेळी विरूद्ध पक्षाचे म्हणणे काय आहे हे पण ते ऐकून घेत. त्यानुसार कैफियत तयार करत. वस्तुस्थिती आणि कायदा यांचा मोठ्या कुशलतेने ते मेळ घालीत. लॉ रिपोर्टसचे सतत वाचन, जुन्या निवाड्यांची चपखल माहिती, हजरजबाबीपणामुळे प्रतिपक्षास सहज निरूत्तर करण्याची हातोटी, यामुळे ते यशस्वी वकील झाले. हळूहळू त्यांची कीर्ती एवढी पसरत चालली की सांगलीखेरीज बुधगाव, इचलकरंजी, कुरूंदवाड, जत, जमखंडी इतक्या ठिकाणी त्यानी सनद काढली होती. वेळप्रसंगी सांगलीच्या संस्थानिकांविरूद्ध एखाद्या अशिलाचे वकिलपत्र घेण्यास ते कचरत नसत., मात्र अशिलावर खरोखरीच अन्याय झाला आहे, अशी खातरजमा झाली तरच!
{{gap}}त्यांची परमार्थाची आवड वाढली, साधना वाढली, तसतसा त्याना आपला 'वकिली पेशा' अडचणीचा वाटू लागला. वकिलीचा धंदा हा सचोटीचा म्हणून कधीच समाजमान्य नव्हता. तेव्हा हा व्यवसाय सोडावा आणि दुसरा एखादा सचोटीचा, सात्त्विक स्वरूपाचा अुद्योग करावा की काय, अशी चलबिचल त्यांच्या मनात सुरू<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...........................६०</noinclude>
5og1utmsth5blcge4udcgb0q2qvy3xa
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८५
104
77611
236198
202387
2026-08-25T15:41:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236198
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>झाली. अशा संभ्रमित अवस्थेत असताना नेहेमीप्रमाणे त्यांना लक्ष्मीअक्कांचा मार्गदर्शक सल्ला मिळाला. त्या म्हणाल्या, "बाबारे, हा विचार सुध्दा तू मनांत आणू नको. तुझ्या छायेखाली पाच-पंचवीस माणसं जगत आहेत आणि त्यांची संख्या अुत्तरोत्तर वाढणार आहे. तुला वाडवडिलांच ऋण पण फेडायचं आहे...हाच धंदा नेकीने कर. थोडा अप्रशस्त मार्गाचा अवलंब करावा लागतो तर त्यावर उपाय म्हणजे रुपयातील एक आणा तू साधुमहाराजांपुढे कापूर जाळण्याप्रीत्यर्थ खर्च करीत जा, म्हणजे त्यांच्या कृपेने तुझे सर्व काही ठीक होईल.”
{{gap}}असा कापूर किती खर्च झाला त्याचा हिशोबच नाही! मात्र अक्कांचा सल्ला बिनतोड ठरला. पुढे त्यांच्या आशिर्वादाप्रमाणे घराण्यावरचे सर्व कर्ज फिटले. दोन्ही वेळच्या पंक्तीला पाच-पन्नास माणसं जेवू लागली.
{{gap}}तात्यासाहेब कोटणीस म्हटलं की कीर्तन असा एक द्वंद्व समासच डोळ्यासमोर येतो. एक अद्भुत वाटावी अशी विलक्षण कीर्तनपरंपरा त्यानी सुरू केली. १८८६ मध्ये त्याना गुरूपदेश मिळाला. तेव्हापासून वर्षातून किमान दोन वेळा, आराधना आणि रथोत्सवासाठी ते गुरूक्षेत्र चिमड येथे जाऊ लागले. तेथे त्यांनी प्रासंगिक स्वरूपाची छोटी कीर्तने केली होती. तेवढ्यावरून त्यांच्या कीर्तनगुणांची परीक्षा महाराजाना झाली होती "तुझी कीर्तने इत्युत्तर रसभरित होत जातील आणि ती ऐकावयास राजे लोकही येतील.” असा त्यानी तात्याना आशीर्वाद दिला. त्यावेळी तात्यांचे वय केवळ सव्वीस वर्षाचे होते. तरीसुध्दा 'नेटका प्रपंच' करण्याच्या कामामध्ये, वाढता प्रपंच आणि वाढते कर्ज अशा कात्रीत सापडल्यामुळे, पुढील सात-आठ वर्षे तरी त्याना 'कीर्तन प्रपंच' मांडण्यास सवड झाली नाही. मात्र १८९८ मध्ये तेरदाळला बिऱ्हाड मांडलेले असताना, घरमालक शंकरराव फडणीस यांच्या आग्रहाने आठवड्यातून सोमवार, गुरूवार या वारी आणि एकादशीला त्यांची कीर्तने सुरू झाली. १८९९ मध्ये अखेरीस एक चांगला योग आला. सांगलीच्या प्लेगच्या भीषण साथीमुळे आबासाहेब सांबारे तेरदाळला राहावयास आले होते. ते स्वतः हार्मोनियम वाजवत आणि तालाला फार पक्के असत. स्वतः तात्या आणि त्यांचे साथीदार तालाला थोडे कच्चे आहेत, हे लक्षात आल्यावर, आबासाहेबानी स्वतः मेहनत घेऊन, तात्यांचे कीर्तनातील हे तालाचे अंग पूर्णपणे अव्यंग केले! अुत्तर आयुष्यात तात्यासाहेबाना त्याचा फार फायदा झाला.
{{gap}}सांगलीत पुन्हा स्थायिक झाल्यावर मात्र त्यांची कीर्तने नियमितपणे होऊ लागली. याचं मुख्य कारण म्हणजे वकिली धंद्यात त्यांचा चांगला जम बसला. पत्नीच्या आजाराची तक्रार नष्ट झाली.{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.............................६१</noinclude>
3e4db4j2075s6aar6zthuxth6o9bwi1
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८६
104
77612
236199
202389
2026-08-25T15:43:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236199
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}प्रथम थोडेसे मंगलाचरण, नंतर सदगुरुंस नमन, तदनंतर निरूपणाचे पद्य अशा पद्धतीने तात्यासाहेब कीर्तनास प्रारंभ करीत. पद्य म्हणून झाल्यावर फार पाल्हाळ न लावता ते निरूपण करण्यास सुरूवात करीत. निरूपणास निवडलेल्या पद्याच्या विवरणास रंग भरायला लागे. साधुसंतांच्या वचनांचे आधार देत देत पूर्वरंग पूर्ण होई. त्यापुढे एखादे आख्यान, शेवटी संतांची गोष्ट, "हेचि दान देगा देवा," आरती खिरापत असं त्यांच्या दैनंदिन कीर्तनाचे सामान्यतः स्वरूप होते.
{{gap}}सांगलीच्या भाविक मंडळीना एरवी पहावयास, ऐकावयास मिळणार नाही असे संतवाङमय त्यानी आपल्या कीर्तनातून वैपुल्याने ऐकविले. वेदांचे, अपनिषदांचे, भगवद्गीतेचे आणि साधु-संतांचे तत्त्वज्ञान एकच आहे, हे त्यानी पुनःपुन्हा श्रोत्याना पटवले. हरिभक्तीचा आणि गुरूभक्तीचा नमुनेदार आदर्श स्वतःच्या अदाहरणाने लोकांसमोर ठेवला.
{{gap}}आणि मुख्य म्हणजे हे सगळे संत एकनाथांप्रमाणे संसारात 'राहून' त्यानी केले.
{{gap}}त्यांच्या श्रोतेमंडळीमध्ये सामान्य कुणबी, नोकरवर्ग,सामान्य भाविक बायकांपासून तो अच्चविद्याविभूषित डॉक्टर्स, विद्वान हे सुध्दा असत. सुरवातीला वकीलमंडळींमध्ये 'टाळकुट्या कथेकरी' म्हणून त्यांची हेटाळणी होई. पण अनुभवांती हे पाणी काही 'वेगळेच' आहे ह्याची यथार्थ जाणीव त्या सर्वाना होऊ लागली. त्यांच्या अंगी संतपणाचे अतींद्रिय स्वरूप परिपक्व झाले आहे हे जाणकारांच्या हळू हळू लक्षात येऊ लागले.
{{gap}}कीर्तनकारास अत्यंत आवश्यक गुण म्हणजे वेगवेगळे चपखल दाखले देणे. तेव्हा वेगवेगळ्या संतांची, कवींची काव्ये मुखोद्गत हवीत. तात्यासाहेबांचे पाठांतर विलक्षण होते. त्यांच्या स्वतःच्या संग्रहात १२२५ ग्रंथ होते. त्यात काही इंग्रजी होते. ते सर्व ग्रंथ त्यानी नुसतेच नजरेखालून घातले होते असे नाही तर त्या ग्रंथांचा त्यांचा अभ्यास होता. काही ग्रंथ तर त्यांच्या नित्यपाठात होते. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपानदेव, गोरा कुंभार, सावता माळी यांच्या अपलब्ध असलेल्या सर्व रचना त्याना तोंडपाठ होत्या. तुकारामाची गाथा, एकनाथांची भजने- भारूडे त्याना मुखोद्गत होती. समर्थांचे सगळे ग्रंथ त्यांच्या नित्यपाठात होते. त्यातील शेकडो अवतरणे नेहेमीच्या कीर्तनात येत. याखेरीज नरसी मेहता, आनंदमूर्ती, दासोपंत, इत्यादिकांची पदे त्याना पाठ होती. कबीर, सूरदास, मीराबाई यांच्या रचनांचा त्यांच्या कीर्तनात सढळपणे वापर असे. इतकेच काय, पण कनकदास, पुरंदर विठ्ठल अशा कानडी कवीना पण त्यांच्या<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर................................६२</noinclude>
nusmn6yo38i11munp6l3huscubizism
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८७
104
77613
236200
202390
2026-08-25T15:47:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236200
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>कीर्तनात जागा असे. संस्कृत वाङमयातील योगवासिष्ठ, शंकराचार्यांचे ग्रंथ, यातील अनेक अवतरणे ते सहजी अधृत करीतच, तर कधी भर्तृहरी, जगन्नाथपंडित हे सुध्दा त्यांच्या कथनात येत. नित्य कीर्तनात सहसा कविता येत नसत तरीसुध्दा मोरोपंत, वामनपंडित, मुक्तेश्वर त्यांच्या संग्रही होते. या छापील पुस्तकांखेरीज एकूण ८० हस्तलिखित चोपड्या त्यांच्याकडे होत्या. त्यांची मधुकरवृत्ती विलक्षण सजग होती. एखादा गोसावी दारावरून एखादे पद म्हणत गेला, ते पद त्याना आवडले, आणि आपल्या संग्रही ते पद नाही असा नुसता संशय वाटला तरी त्याला तात्यासाहेब बोलावून घेत. योग्य दक्षिणा देत आणि स्वहस्ते पदाची नक्कल करून घेतं.
{{gap}}अशी जबरदस्त साधना असल्यामुळे त्यांच्या कीर्तनात नेहमीच नाविन्य भासे. ताजेपणा असे.
{{gap}}तात्यासाहेबांच्या कीर्तनाचा आवाका जसा मोठा तसा त्यांच्या कीर्तनाचा थाटहि विलक्षण असे. कीर्तनसाथ फारच मोठी आणि विविधतेने नटलेली असे. तबलजी, पेटीवाला, झांज, पखवाज आणि प्रत्यक्ष गाण्याची साथ करणारे असे सर्व मिळून बारापासून, वीसपर्यंत साथीदारांची संख्या असे. क्वचित यापेक्षा अधिकच. (आजच्या भाषेत म्हणजे ऑर्केस्ट्राच म्हणायला हवा!) तात्यासाहेबांचे चरित्रकार, कवि साधुदास स्वतः या साथीदारांमध्ये अभे राहून पदे म्हणत असत. त्यानी ह्या सर्व साथीदार मंडळींची नावे मोठ्या मजेदाररीतीने एका श्लोकात गुंफली आहेत. तो श्लोक असा:-

{{center|<poem>'काका 'झांज' धरी, 'जनू' सूर- करी, साथीस 'नाना' करी
'आप्पांचा' पखवाज, 'दीक्षित' बसे सानंद पेटीवरी ।
'अंतोबा' करताल देति, 'पंता' मुखी मूर्छना
गातो गायन 'साधुदास'; करिती 'तात्या' यदा कीर्तना ॥"</poem>}}
{{gap}}त्या त्या साथीदारांच्या प्रचारातील नावांवरून ही गुंफण होती. गंमत म्हणजे या साथीदार मंडळीत प्रतिष्ठित डॉक्टर, संगीतज्ञ, मामलेदार तर होतेच पण सांगलीजवळच्या कर्नाळचा न्हावी, शिरोळचा शिंपी, कोकेवाला अशी विविध थरातील मंडळी या ताफ्यात होती. वाकबगार पेटीवाला आणि अुत्तम गाणारी मंडळी असतील तर तात्यासाहेब त्यांजकडून रागदारीची पदे म्हणवून घेत असत.
{{gap}}तात्यासाहेबांचे कीर्तनाचे एक मोठे वैशिष्टय म्हणजे त्यानी कीर्तनाचा कधीहि 'व्यवसाय' केला नाही. अुभ्या हयातीत एक नवा पैसा सुध्दा त्यानी कीर्तन केल्यावर घेतला नाही. अखंड २४-२५ वर्षे नित्यशः किमान दोन तास तरी कीर्तन केले.<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..............................६३</noinclude>
26z7xggzvt8kedrfr1j50hy3xawuvsi
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८८
104
77614
236201
202391
2026-08-25T15:49:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236201
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>समर्थांच्या वचनाप्रमाणे "आपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा । हरिकथेविण सर्वथा राहोचि नये ॥" त्यानी आयुष्यात नऊ हजारांहून अधिक कीर्तने हरिसेवा म्हणून सहज केली असतील. परगावी कीर्तनासाठी साथीदार मंडळी घेऊन जायची वेळ आली तरीहि कोणाची कपर्दिकहि घेतली नाही. याबाबत बोलताना ते स्वतःच तुकाराममहाराजांचा दृष्टांत देत. तुकोबारायानी स्पष्टपणे सांगितलंय "जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ॥ तट्टावृषभासी दाणा । घेऊ नये कधी जाणा ॥ बुक्का लावू नये भाळा । हार घालू नये गळा ॥' असा इशारा देत पुढे तुकोबानी असं बजावलंय की, हरिदासाला देणारा आणि तो ते घेणारा असे दोघेहि नरकाला जातात- "तुका म्हणे देती । घेती तेहि नरका जाती" ।
{{gap}}आजकाल ही गोष्ट कुणाच्या ध्यानातही येत नाही अितक्या सवंगपणाने कीर्तनाचा धंदा झाला आहे. तात्यासाहेबानी कीर्तन हे एक व्रत म्हणून चालवलेले होते. आवडीने स्वीकारलेले व सेवाभावाने चालवलेले ते एक "पवित्रतम व्रत" होते. कीर्तनकार म्हणून त्यांच्या बाबतीत सहज लक्षात न येणारी गोष्ट म्हणजे ते एक आत्मानुभवी साधुपुरूष व पराकाष्ठेचे क्रियाशील गुरुभक्त होते. त्यांच्या कीर्तनाची अंची आणि लोकप्रियता केवळ पाठांतर, वक्तृत्व, गायनवादन या गुणांवर अधिष्ठित नव्हती तर ती त्यांच्या आत्मानुभवाच्या जिव्हाळ्यावर होती.
{{gap}}तात्यासाहेबांच्या अशा लोकविलक्षण कीर्तननिष्ठेमुळे, त्यांचे निरूपण ऐकण्यासाठी मोठमोठी मंडळी सांगलीत येत असत. संत वाङ्मयाचे महान अभ्यासक श्री. ल. रा. पांगारकर, श्रीमत् दीक्षितस्वामी, डॉ. कुर्तकोटी, समर्थभक्त श्री. शंकरराव देव, निंबाळचे गुरूदेव रानडे अशी मोठमोठी मंडळी त्यांच्या कीर्तनास आवर्जून उपस्थित राहिलेली आहेत. सांगलीत तर रोजची हजार-पाचशे भक्तमंडळी, रात्री नेमाने कीर्तनास येत. राजकुटुंबातील मंडळीना किंवा अच्चपदस्थांना सामान्य लोकांप्रमाणे श्रवणभक्ती. करता येत नसे. म्हणून सांगलीकर, इचलकरंजीकर, कुरूंदवाडकर अशा संस्थानिकांनी आपापल्या राजवाड्यांतून तात्यासाहेबांची खास कीर्तने आयोजित केली होती.
{{gap}}तात्यासाहेबांची समाजातील प्रतिमा एका रसाळ कीर्तनकाराची होती. पण थोर संतांच्या मालिकेत शोभण्यासारखी त्यांची गौरवास्पद योग्यता आहे, म्हणजेच सिद्धावस्थेस पोचलेले ते साधुपुरूष आहेत, ही जाणीव त्यांच्या सर्वसामान्य भक्तजनांस नव्हती. फारच थोड्या निकटवर्तियांस ही गोष्ट ज्ञात होती. त्यांचे रसाळ चरित्र लिहिणारे साधुदास यानी दोन तीन अनुभव दिले आहेत. ते मोठे बोलके आहेत. एकदा १९०१ च्या प्लेगच्या साथीच्या दिवसात, सांगलीवासी मंडळी गावाबाहेर राहायला जात, तेव्हा तात्यासाहेब साधुदासांच्या मळ्यात राहायला आले होते. साधुदासांच्या<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...........................६४</noinclude>
lac6jkwsadwet0818yq7u8j93h4k44c
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८९
104
77615
236202
202392
2026-08-25T15:52:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236202
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>चुलत्यांचा म्हणजे बाबासाहेब मुजुमदारांचा आणि तात्यासाहेबांचा चांगला स्नेह होता याचा आधी अुल्लेख आला आहेच. साधुदास त्यावेळी विद्यार्थीदशेत होते. त्यामुळे रात्री-बेरात्री अभ्यासाला अुठत असत. तसे ते एकदा अभ्यासासाठी अुठले. तात्यांना त्रास होऊ नये म्हणून रात्री अुठून दिवा पेटवावा (त्यावेळी अिलेक्ट्रिसिटी नव्हती) आणि वाचत बसावे असा त्यांचा विचार होता. पाहतात तर तात्यासाहेब आपल्या अंथरुणावर मांडी घालून नामस्मरण करत बसलेले दिसले. ते मध्यरात्रीनंतर झोपतील म्हणून बघितले तरी तोच प्रकार! असे वेगवेगळ्या रात्री बघितले तरी तेच दृश्या ! हा प्रकार त्यांच्या लक्षात आला तेव्हा ते साधुदासाना (म्हणजेच गोपाळराव मुजुमदाराना) म्हणाले, "गोपाळ, मी जागा आहे म्हणून तू अभ्यास करायचं चुकवू नकोस.” साधुदासानी म्हटलय की तात्यासाहेबानी निद्रा संपूर्णपणे जिंकली होती. “साधकाची दशा अदास असावी” या तुकोबांच्या सांगीप्रमाणे त्यानी आपली वृत्ती अदास ठेवली होती. साधुदासानी म्हटलय की ही साधनसिद्धता केव्हा पुरी झाली, याची नक्की खातरजमा देता येत नसली, तरी एका अनुभवावरून त्यानी तर्क बांधला होता की १८८६ साली सद्गुरूंचा मंत्रानुग्रह मिळाल्यावर, सुमारे १६ वर्षांच्या खडतर साधनेनंतर ते सिद्धाच्या अवस्थेस पोचले असावेत. त्यासंबंधातील स्वतःचा आणखी एक अनुभव सांगताना साधुदासानी लिहिलय की १९०५च्या सुमारास तात्यासाहेबांच्या घरी शिकण्यासाठी म्हणून एक मुलगा राहात असे. थोडीशी साधना जमू लागल्यावर तात्यासाहेबानी आपल्याला मंत्रानुग्रह द्यावा म्हणून त्याची सारखी धडपड चालू होती. काही यश येईना म्हणून त्याने साधुदासांचा सल्ला घेतला. तेव्हा साधुदास म्हणाले "तू त्याना अजिबात त्रास देऊ नकोस. रोज पहाटे अठून त्यांचे घटकाभर मनोभावे चिंतन करीत जा." असा प्रकार काही दिवस झाल्यावर तात्यासाहेब अचानक त्या विद्यार्थ्यापाशी आले, आणि म्हणाले "अहो ढवळीकर, माझे स्मरण करावे असा मी काही 'देव' नाही. गोपाळराव सांगणारे एक शहाणे आणि तुम्ही ऐकणारे सात शहाणे." ह्या प्रसंगावरून तात्यासाहेबाना सिद्धावस्था प्राप्त झाली होती असा साधुदासांचा कयास होता.
{{gap}}आणखी एका प्रसंगाची हकीगत अधिकच बोलकी आहे. सांगलीजवळील डिग्रज येथे हुसेनबाळा तांबोळी नावाचा सात्त्विक मुसलमान राहात असे. एकदा त्याने पूर्ण श्रद्धेने “रामविजय" ग्रंथाचे पारायण सुरू केले. ग्रंथसमाप्ती तात्यासाहेबांच्या हस्ते व्हावी आणि त्यांच्या कीर्तनाने सांगता व्हावी अशी त्याची अतीव अिच्छा होती. पण “आपण मुसलमान, मग कसचे कोटणीसमहाराज येतात?" असे विचार मनात येऊन तो खिन्न होत असे. अचानक एके रात्री त्याला स्वप्न पडले. स्वप्नात कोटणीस<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..........................६५</noinclude>
k7no7e7l9dls65gq2wy24bh920nhxou
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/९०
104
77616
236203
202393
2026-08-25T15:56:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236203
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>महाराज आले. त्यानी त्याला सांगितले "तू कीर्तनाची सिध्दता कर. मी अवश्य येईन." आनंदित झालेला हुसेनबाळा नंतर सांगलीत आला. स्वप्नदृष्टांतामुळे त्याला धीर आला होता. तरीपण त्याने भीतभीत कोटणीस महाराजाना आपली मनातील अिच्छा सांगितली. तेव्हा तात्यासाहेब म्हणाले "मी तुला येतो म्हणून एकदा सांगितलय ना?” ते ऐकून हुसेनबाळा चाट पडला. मग दहा-बारा साथीदार घेऊन तात्यासाहेब डिग्रजला गेले. तेथील कीर्तनात इस्लामची मूळ तत्त्वे कशी अुदात्त आहेत, ते त्यानी स्पष्ट करुन सांगितले. "कबीर कमालांच्या" दोह्यांची बरसात केली. (सर्वधर्मसमभावाच्या कल्पनेचा बेगडी अवतार अजून व्हावयाचा होता!)
{{gap}}असा हा 'आधुनिक एकनाथ' म्हणजे तात्यासाहेब कोटणीस, यांचे २७ जानेवारी १९२४ रोजी दुःखद निधन झाले. आयुष्यभर त्यानी देवापुढे अभे राहूनच कीर्तन केले. प्रकृती ढासळली तरी हा क्रम चुकला नाही. शेवटीशेवटी प्रकृतीची स्थिती गंभीर झाल्यावर, अनुयायांच्या तळमळीच्या आग्रहाखातर शेवटचे सहा महिनेच त्यानी व्यासपीठावर बसून कीर्तन केले. त्यानी आयुष्यभर जोडलेली पुण्याई एवढी जबरदस्त की त्यांची अध्यात्म-परंपरा त्यांच्या पुत्रपौत्रानी आज ७५ वर्षानंतरही अबाधितपणे चालू ठेवली आहे.
{{gap}}जून १९०० मध्ये त्यानी कीर्तनास, अखंडित कीर्तनास, सांगलीत सुरुवात केली. त्या घटनेस आता, २१ व्या शतकात पदापर्ण केल्यावर, शंभर वर्षे पूर्ण झाली. सांगलीची कीर्तनप्रेमी मंडळी त्या कीर्तन-तपस्व्याच्या महानतेचा मोठ्या प्रमाणावर जाहीरपणे अद्घोष करतील यात काय शंका ?

{{center|●●●}}{{nop}}<noinclude>सांगली आणि सांगलीकर..........................६६</noinclude>
b6xdjid3fndytjcaefulimcprf03pzw
अनुक्रमणिका:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf
106
104089
236205
236155
2026-08-26T07:20:46Z
कल्पनाशक्ती
3813
236205
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=लंकेचें वर्णन व वृतांत
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो" 62="कँडी व पेरेडॅनिया" 66="फोटो" 73="फोटो" 79 ="खडक-देऊळ व खडक-किल्ला" 82="फोटो" 87="फोटो" 92 ="बॅटिकोला व त्रिंकोमाली"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
q9b5geoxnojiwhq8o05pwcouug646yw
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/५
104
111857
236181
236079
2026-08-25T12:03:31Z
Shurpalimedha
5041
236181
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{center|दादर}}
दादर - मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थित्यंतरांचे आगर चळवळी आंदोलनांचे उगमस्थान. संगीत, नाट्य, क्रीडा, साहित्य यांचे माहेरघर. नामवंत, कीर्तिवंतांची कर्मभूमी. खरेदीदारांचे नंदनवन. आताच्या 'सेंट्रल रेल्वे'ला पूर्वी 'जीआयपी रेल्वे' व 'वेस्टर्न रेल्वे' ला 'बीबीसाय रेल्वे' म्हणायचे. या रेल्वे लाइनने दादरचे 'पूर्व' व 'पश्चिम' असे दोन विभाग केलेले असले तरी दादर म्हटले की, पश्चिम दादर असे गृहीत धरले जायचे. अशा या दादरच्या दक्षिण टोकाला म्हणजे गोखले रोड (दक्षिण) जेथे संपतो व 'रवींद्र नाट्यमंदिरा'पासून परळ नाक्यापर्यंत धावणारा सयानी रोड त्याला काटकोनात जुळतो, तेथे पंचवीस वर्षे राहिलो. त्यानंतर दादरच्या उत्तर टोकाला म्हणजे 'हरी निवास'च्या नाक्यावर राहायला आलो. इथे आलो त्याला पन्नास वर्षे होऊन गेली. घडलो, वाढलो दादरला. शिक्षण, संस्कार दादरमधले. बालपण, शैशव, तारुण्य आणि त्यानंतर ओघाने येणारे ज्येष्ठ नागरिकत्व हे सर्व दादरच्या कुशीतच घडले. मी दादर सोडले नाही व दादरने मला सोडले नाही. या दादरने आम्हाला खूप काही दिले.

{{gap}}या दादरने खूप काही पाहिले, खूप काही सोसले. अतिरेकी हल्ले पचवले, ढगफुटी पाहिली, वादळे सोसली. धरणीकंप पचवले, राजकीय पक्षांचा जन्म पाहिला. 'चले जाव' आंदोलन, स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, इंग्रजांची गुलामगिरी व स्वातंत्र्याचा जल्लोषही अनुभवला. त्यानंतर झालेला अपेक्षाभंगही सोसला.

{{gap}}दादरमधल्या वाड्या गेल्या व सोसायटीच्या इमारती आल्या. भाजीचे मळे, मोटा, विहिरी, नारळांची झाडे, झोपड्या गेल्या. एकत्र कुटुंबपद्धती गेली व विभक्त कुटुंबपद्धती आली. चाळ संस्कृती गेली व फ्लॅट संस्कृती आली.

{{gap}}यातले चांगले काय, वाईट काय, हे ठरविण्याऐवजी ते दिवस कसे होते, यासंबंधीच्या आठवणी सांगणे हा मुख्य उद्देश आहे.

{{right|दादर । १}}<noinclude></noinclude>
rqhi47oacdj73nfwa3hlgzrkgs8fm6u
236182
236181
2026-08-25T12:08:18Z
Shurpalimedha
5041
236182
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>

{{center|दादर}}

दादर - मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थित्यंतरांचे आगर. चळवळी - आंदोलनांचे उगमस्थान. संगीत, नाट्य, क्रीडा, साहित्य यांचे माहेरघर. नामवंत, कीर्तिवंतांची कर्मभूमी. खरेदीदारांचे नंदनवन. आताच्या 'सेंट्रल रेल्वे'ला पूर्वी 'जीआयपी रेल्वे' व 'वेस्टर्न रेल्वे' ला 'बीबीसाय रेल्वे' म्हणायचे. या रेल्वे लाइनने दादरचे 'पूर्व' व 'पश्चिम' असे दोन विभाग केलेले असले तरी दादर म्हटले की, पश्चिम दादर असे गृहीत धरले जायचे. अशा या दादरच्या दक्षिण टोकाला म्हणजे गोखले रोड (दक्षिण) जेथे संपतो व 'रवींद्र नाट्यमंदिरा'पासून परळ नाक्यापर्यंत धावणारा सयानी रोड त्याला काटकोनात जुळतो, तेथे पंचवीस वर्षे राहिलो. त्यानंतर दादरच्या उत्तर टोकाला म्हणजे 'हरी निवास'च्या नाक्यावर राहायला आलो. इथे आलो त्याला पन्नास वर्षे होऊन गेली. घडलो, वाढलो दादरला. शिक्षण, संस्कार दादरमधले. बालपण, शैशव, तारुण्य आणि त्यानंतर ओघाने येणारे ज्येष्ठ नागरिकत्व हे सर्व दादरच्या कुशीतच घडले. मी दादर सोडले नाही व दादरने मला सोडले नाही. या दादरने आम्हाला खूप काही दिले.

{{gap}}या दादरने खूप काही पाहिले, खूप काही सोसले. अतिरेकी हल्ले पचवले, ढगफुटी पाहिली, वादळे सोसली. धरणीकंप पचवले, राजकीय पक्षांचा जन्म पाहिला. 'चले जाव' आंदोलन, स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, इंग्रजांची गुलामगिरी व स्वातंत्र्याचा जल्लोषही अनुभवला. त्यानंतर झालेला अपेक्षाभंगही सोसला.

{{gap}}दादरमधल्या वाड्या गेल्या व सोसायटीच्या इमारती आल्या. भाजीचे मळे, मोटा, विहिरी, नारळांची झाडे, झोपड्या गेल्या. एकत्र कुटुंबपद्धती गेली व विभक्त कुटुंबपद्धती आली. चाळ संस्कृती गेली व फ्लॅट संस्कृती आली.

{{gap}}यातले चांगले काय, वाईट काय, हे ठरविण्याऐवजी ते दिवस कसे होते, यासंबंधीच्या आठवणी सांगणे हा मुख्य उद्देश आहे.

{{right|दादर । १}}<noinclude></noinclude>
nywah7r69cpei0appcye8am3jqw1bmy
236183
236182
2026-08-25T12:09:05Z
Shurpalimedha
5041
236183
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>

{{center|{{larger|'''दादर'''}}}}

दादर - मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थित्यंतरांचे आगर. चळवळी - आंदोलनांचे उगमस्थान. संगीत, नाट्य, क्रीडा, साहित्य यांचे माहेरघर. नामवंत, कीर्तिवंतांची कर्मभूमी. खरेदीदारांचे नंदनवन. आताच्या 'सेंट्रल रेल्वे'ला पूर्वी 'जीआयपी रेल्वे' व 'वेस्टर्न रेल्वे' ला 'बीबीसाय रेल्वे' म्हणायचे. या रेल्वे लाइनने दादरचे 'पूर्व' व 'पश्चिम' असे दोन विभाग केलेले असले तरी दादर म्हटले की, पश्चिम दादर असे गृहीत धरले जायचे. अशा या दादरच्या दक्षिण टोकाला म्हणजे गोखले रोड (दक्षिण) जेथे संपतो व 'रवींद्र नाट्यमंदिरा'पासून परळ नाक्यापर्यंत धावणारा सयानी रोड त्याला काटकोनात जुळतो, तेथे पंचवीस वर्षे राहिलो. त्यानंतर दादरच्या उत्तर टोकाला म्हणजे 'हरी निवास'च्या नाक्यावर राहायला आलो. इथे आलो त्याला पन्नास वर्षे होऊन गेली. घडलो, वाढलो दादरला. शिक्षण, संस्कार दादरमधले. बालपण, शैशव, तारुण्य आणि त्यानंतर ओघाने येणारे ज्येष्ठ नागरिकत्व हे सर्व दादरच्या कुशीतच घडले. मी दादर सोडले नाही व दादरने मला सोडले नाही. या दादरने आम्हाला खूप काही दिले.

{{gap}}या दादरने खूप काही पाहिले, खूप काही सोसले. अतिरेकी हल्ले पचवले, ढगफुटी पाहिली, वादळे सोसली. धरणीकंप पचवले, राजकीय पक्षांचा जन्म पाहिला. 'चले जाव' आंदोलन, स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, इंग्रजांची गुलामगिरी व स्वातंत्र्याचा जल्लोषही अनुभवला. त्यानंतर झालेला अपेक्षाभंगही सोसला.

{{gap}}दादरमधल्या वाड्या गेल्या व सोसायटीच्या इमारती आल्या. भाजीचे मळे, मोटा, विहिरी, नारळांची झाडे, झोपड्या गेल्या. एकत्र कुटुंबपद्धती गेली व विभक्त कुटुंबपद्धती आली. चाळ संस्कृती गेली व फ्लॅट संस्कृती आली.

{{gap}}यातले चांगले काय, वाईट काय, हे ठरविण्याऐवजी ते दिवस कसे होते, यासंबंधीच्या आठवणी सांगणे हा मुख्य उद्देश आहे.

{{right|दादर । १}}<noinclude></noinclude>
8hvps2bgj4xnrq9ggxkczetbxyvc4ds
236184
236183
2026-08-25T12:10:05Z
Shurpalimedha
5041
236184
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>

{{center|{{xx-larger|'''दादर'''}}}}

दादर - मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थित्यंतरांचे आगर. चळवळी - आंदोलनांचे उगमस्थान. संगीत, नाट्य, क्रीडा, साहित्य यांचे माहेरघर. नामवंत, कीर्तिवंतांची कर्मभूमी. खरेदीदारांचे नंदनवन. आताच्या 'सेंट्रल रेल्वे'ला पूर्वी 'जीआयपी रेल्वे' व 'वेस्टर्न रेल्वे' ला 'बीबीसाय रेल्वे' म्हणायचे. या रेल्वे लाइनने दादरचे 'पूर्व' व 'पश्चिम' असे दोन विभाग केलेले असले तरी दादर म्हटले की, पश्चिम दादर असे गृहीत धरले जायचे. अशा या दादरच्या दक्षिण टोकाला म्हणजे गोखले रोड (दक्षिण) जेथे संपतो व 'रवींद्र नाट्यमंदिरा'पासून परळ नाक्यापर्यंत धावणारा सयानी रोड त्याला काटकोनात जुळतो, तेथे पंचवीस वर्षे राहिलो. त्यानंतर दादरच्या उत्तर टोकाला म्हणजे 'हरी निवास'च्या नाक्यावर राहायला आलो. इथे आलो त्याला पन्नास वर्षे होऊन गेली. घडलो, वाढलो दादरला. शिक्षण, संस्कार दादरमधले. बालपण, शैशव, तारुण्य आणि त्यानंतर ओघाने येणारे ज्येष्ठ नागरिकत्व हे सर्व दादरच्या कुशीतच घडले. मी दादर सोडले नाही व दादरने मला सोडले नाही. या दादरने आम्हाला खूप काही दिले.

{{gap}}या दादरने खूप काही पाहिले, खूप काही सोसले. अतिरेकी हल्ले पचवले, ढगफुटी पाहिली, वादळे सोसली. धरणीकंप पचवले, राजकीय पक्षांचा जन्म पाहिला. 'चले जाव' आंदोलन, स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, इंग्रजांची गुलामगिरी व स्वातंत्र्याचा जल्लोषही अनुभवला. त्यानंतर झालेला अपेक्षाभंगही सोसला.

{{gap}}दादरमधल्या वाड्या गेल्या व सोसायटीच्या इमारती आल्या. भाजीचे मळे, मोटा, विहिरी, नारळांची झाडे, झोपड्या गेल्या. एकत्र कुटुंबपद्धती गेली व विभक्त कुटुंबपद्धती आली. चाळ संस्कृती गेली व फ्लॅट संस्कृती आली.

{{gap}}यातले चांगले काय, वाईट काय, हे ठरविण्याऐवजी ते दिवस कसे होते, यासंबंधीच्या आठवणी सांगणे हा मुख्य उद्देश आहे.

{{right|दादर । १}}<noinclude></noinclude>
ptb9wa7wrb7w4dlfltzhukvtwmd1ugp
236185
236184
2026-08-25T12:10:39Z
Shurpalimedha
5041
236185
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>

{{center|{{xx-larger|दादर}}}}

दादर - मुंबईतील महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय स्थित्यंतरांचे आगर. चळवळी - आंदोलनांचे उगमस्थान. संगीत, नाट्य, क्रीडा, साहित्य यांचे माहेरघर. नामवंत, कीर्तिवंतांची कर्मभूमी. खरेदीदारांचे नंदनवन. आताच्या 'सेंट्रल रेल्वे'ला पूर्वी 'जीआयपी रेल्वे' व 'वेस्टर्न रेल्वे' ला 'बीबीसाय रेल्वे' म्हणायचे. या रेल्वे लाइनने दादरचे 'पूर्व' व 'पश्चिम' असे दोन विभाग केलेले असले तरी दादर म्हटले की, पश्चिम दादर असे गृहीत धरले जायचे. अशा या दादरच्या दक्षिण टोकाला म्हणजे गोखले रोड (दक्षिण) जेथे संपतो व 'रवींद्र नाट्यमंदिरा'पासून परळ नाक्यापर्यंत धावणारा सयानी रोड त्याला काटकोनात जुळतो, तेथे पंचवीस वर्षे राहिलो. त्यानंतर दादरच्या उत्तर टोकाला म्हणजे 'हरी निवास'च्या नाक्यावर राहायला आलो. इथे आलो त्याला पन्नास वर्षे होऊन गेली. घडलो, वाढलो दादरला. शिक्षण, संस्कार दादरमधले. बालपण, शैशव, तारुण्य आणि त्यानंतर ओघाने येणारे ज्येष्ठ नागरिकत्व हे सर्व दादरच्या कुशीतच घडले. मी दादर सोडले नाही व दादरने मला सोडले नाही. या दादरने आम्हाला खूप काही दिले.

{{gap}}या दादरने खूप काही पाहिले, खूप काही सोसले. अतिरेकी हल्ले पचवले, ढगफुटी पाहिली, वादळे सोसली. धरणीकंप पचवले, राजकीय पक्षांचा जन्म पाहिला. 'चले जाव' आंदोलन, स्वातंत्र्यसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, इंग्रजांची गुलामगिरी व स्वातंत्र्याचा जल्लोषही अनुभवला. त्यानंतर झालेला अपेक्षाभंगही सोसला.

{{gap}}दादरमधल्या वाड्या गेल्या व सोसायटीच्या इमारती आल्या. भाजीचे मळे, मोटा, विहिरी, नारळांची झाडे, झोपड्या गेल्या. एकत्र कुटुंबपद्धती गेली व विभक्त कुटुंबपद्धती आली. चाळ संस्कृती गेली व फ्लॅट संस्कृती आली.

{{gap}}यातले चांगले काय, वाईट काय, हे ठरविण्याऐवजी ते दिवस कसे होते, यासंबंधीच्या आठवणी सांगणे हा मुख्य उद्देश आहे.

{{right|दादर । १}}<noinclude></noinclude>
jukcj3hxj12l230075fvp9luwvlfswt
पान:गोष्ट एका डॉक्टरची.pdf/६
104
111858
236186
236080
2026-08-25T12:17:56Z
Shurpalimedha
5041
236186
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{block center/s}}{{gap}}त्या काळात दादरचे रस्ते मातीचे होते. भल्या पहाटे पाण्याची टाकी असलेली बैलगाडी यायची. पाण्याच्या टाकीला मागच्या बाजूला एक आडवा, भोके असलेला पाइप असायचा. गाडीच्या चालकाने दोरी ओढली, की पाइपच्या भोकांतून पाणी बाहेर पडायचे, रस्ता ओला व्हायचा. तो मृद्गंध आता अनुभवाला येत नाही.

{{gap}}उन्हाळ्यात माणसे फूटपाथवर झोपत. फूटपाथ हवेशीर असल्यामुळे छान झोप लागायची! घरात पंख्याची गरज नसे. समुद्रावरून येणारा वारा वाटेत कुठेही न अडखळता सरळ घरात घुसायचा. बहुतेक चाळी बैठ्या किंवा एकमजली. पहाटे पाचला हॉटेल उघडायचे. चहाचा पहिला कप भुतासाठी रस्त्यावर फेकला जाई. विड्या ओढून छातीचा खोका झालेल्या दमेकऱ्यांचा खोकण्याचा आवाज किंवा 'पाण्या निघाली गौळण' या गाण्याच्या ओळीव्यतिरिक्त सर्व काही शांत असायचे. सकाळी सहा-सातनंतर रहदारी चालू होई. 'याss कल्हऽऽई' ही कल्हईवाला आल्याची खूण असायची. 'केरबाऽऽ माऽऽणि केरबा' म्हणत एक ढेरपोट्या मिशीवाला इराणी रस्त्यावर फिरायचा. दृष्ट लागू नये म्हणून आया आपल्या मुलांच्या गळ्यात ही पिवळ्या मण्यांची माळ घालायच्या. कधी दारावर अर्धी लुंगी व छातीभर काळ्या दोराची गुंडाळी बांधलेले 'नाथपंथी' 'यायचे; तर कधी 'जोगवा' मागण्यासाठी दाढी, टक्कल असलेला, साडी नेसणारा माणूस येई. 'हा बाप्या की बाई' हे कोडे असे. कधी बारक्या डोळ्यांचा, पाठीवर कापडाचे बोचके घेतलेला चिनी कापड विक्या येई. आंब्यांच्या दिवसांत 'साक्कर गोट्टी' ओरडत गावठी आंबे विकणारा येई.
दिवेलागणीच्या वेळी बंडी घातलेला एक माणूस हातात लांब काठी घेऊन
पळत रस्त्यावरचे दिवे पेटवीत जायचा. रात्री आठ वाजले की, 'ओपनिंगेऽऽ' असे ओरडत जाणारा माणूस दिसे. त्यानंतर सर्व काही सामसूम होई.

{{gap}}रस्त्यावरील वाहने म्हणजे नाक्या-नाक्यावर उभी असलेली 'व्हिक्टोरिया' नावाची घोडागाडी व दर वीस ते तीस मिनिटांनी येणारी 'बीईएसटी'ची बस. या बसचे 'ए', 'बी', 'सी', 'डी' असे रूट असायचे. गोखले रोडवर 'एफ' रूट यायची आणि प्रभादेवी, टिळक ब्रिजवरून शीवपर्यंत 'जे' रूट जायची. भाडे दोन आणे. व्हिक्टोरियाने दादर स्टेशनला जायला चार आणे भाडे घेत. हे फार जास्त वाटायचे. व्हिक्टोरियाच्या मागच्या दांडीला लोंबकळून कधी कधी आम्ही शाळेत जात असू. हे बघणारे 'गाडीवाले पिछाड़ी चाबूक' असे ओरडायचे. गाडीवाल्याच्या चाबकाचा फटका बसेल, या भीतीने आम्ही मग व्हिक्टोरियाची दांडी सोडत असू.

{{left|२ । गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude>
1id6m4zetap7z2wydrx6wnkv5ldl8c7
236187
236186
2026-08-25T12:22:52Z
Shurpalimedha
5041
236187
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="~2026-46135-33" /></noinclude>{{gap}}त्या काळात दादरचे रस्ते मातीचे होते. भल्या पहाटे पाण्याची टाकी असलेली बैलगाडी यायची. पाण्याच्या टाकीला मागच्या बाजूला एक आडवा, भोके असलेला पाइप असायचा. गाडीच्या चालकाने दोरी ओढली, की पाइपच्या भोकांतून पाणी बाहेर पडायचे, रस्ता ओला व्हायचा. तो मृद्गंध आता अनुभवाला येत नाही.

{{gap}}उन्हाळ्यात माणसे फूटपाथवर झोपत. फूटपाथ हवेशीर असल्यामुळे छान झोप लागायची! घरात पंख्याची गरज नसे. समुद्रावरून येणारा वारा वाटेत कुठेही न अडखळता सरळ घरात घुसायचा. बहुतेक चाळी बैठ्या किंवा एकमजली. पहाटे पाचला हॉटेल उघडायचे. चहाचा पहिला कप भुतासाठी रस्त्यावर फेकला जाई. विड्या ओढून छातीचा खोका झालेल्या दमेकऱ्यांचा खोकण्याचा आवाज किंवा 'पाण्या निघाली गौळण' या गाण्याच्या ओळीव्यतिरिक्त सर्व काही शांत असायचे. सकाळी सहा-सातनंतर रहदारी चालू होई. 'याss कल्हऽऽई' ही कल्हईवाला आल्याची खूण असायची. 'केरबाऽऽ माऽऽणि केरबा' म्हणत एक ढेरपोट्या मिशीवाला इराणी रस्त्यावर फिरायचा. दृष्ट लागू नये म्हणून आया आपल्या मुलांच्या गळ्यात ही पिवळ्या मण्यांची माळ घालायच्या. कधी दारावर अर्धी लुंगी व छातीभर काळ्या दोराची गुंडाळी बांधलेले 'नाथपंथी' 'यायचे; तर कधी 'जोगवा' मागण्यासाठी दाढी, टक्कल असलेला, साडी नेसणारा माणूस येई. 'हा बाप्या की बाई' हे कोडे असे. कधी बारक्या डोळ्यांचा, पाठीवर कापडाचे बोचके घेतलेला चिनी कापड विक्या येई. आंब्यांच्या दिवसांत 'साक्कर गोट्टी' ओरडत गावठी आंबे विकणारा येई.
दिवेलागणीच्या वेळी बंडी घातलेला एक माणूस हातात लांब काठी घेऊन
पळत रस्त्यावरचे दिवे पेटवीत जायचा. रात्री आठ वाजले की, 'ओपनिंगेऽऽ' असे ओरडत जाणारा माणूस दिसे. त्यानंतर सर्व काही सामसूम होई.

{{gap}}रस्त्यावरील वाहने म्हणजे नाक्या-नाक्यावर उभी असलेली 'व्हिक्टोरिया' नावाची घोडागाडी व दर वीस ते तीस मिनिटांनी येणारी 'बीईएसटी'ची बस. या बसचे 'ए', 'बी', 'सी', 'डी' असे रूट असायचे. गोखले रोडवर 'एफ' रूट यायची आणि प्रभादेवी, टिळक ब्रिजवरून शीवपर्यंत 'जे' रूट जायची. भाडे दोन आणे. व्हिक्टोरियाने दादर स्टेशनला जायला चार आणे भाडे घेत. हे फार जास्त वाटायचे. व्हिक्टोरियाच्या मागच्या दांडीला लोंबकळून कधी कधी आम्ही शाळेत जात असू. हे बघणारे 'गाडीवाले पिछाड़ी चाबूक' असे ओरडायचे. गाडीवाल्याच्या चाबकाचा फटका बसेल, या भीतीने आम्ही मग व्हिक्टोरियाची दांडी सोडत असू.

{{left|२ । गोष्ट एका डॉक्टरची}}<noinclude></noinclude>
fyt4s14mcz58o6h85ro18q578xks8ho
सदस्य चर्चा:अविनाश काळे
3
111902
236204
2026-08-26T03:49:30Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
236204
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=अविनाश काळे}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ०९:१९, २६ ऑगस्ट २०२६ (IST)
jo2ny3uatjf1crl1zr8276o1b35qa9g
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८४
104
111903
236206
2026-08-26T07:24:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236206
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|७० |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>या रानांत इतर हिंस्र पशू, व रानटी हत्ती ही आहेत, पण ते या पावसाच्या दिवसांत इकडे येत नाहींत असें कळलें. वाटोवाट लहान मोठे तलाव लागतात. यावरून पूर्व काळी हा सर्व भाग लागवडीला- विशेषतः भातशेतीच्या पिकाच्या लागवडीला आणलेला असावा असें मधून मधून येणाऱ्या सपाटच्या सपाट पण पाणथळ बनलेल्या भूमिभागावरून वाटल्याखेरीज रहात नाहीं. तसेंच हें जंगलही निर्मनुष्य व शतकाच्या शतकें निसर्गस्थितींत असलेलें असें अरण्य भासत नाहीं; तर हयगयीनें व बंदोबस्ताचे अभावी वस्ती नाहींशी झाल्यामुळे उपवनाला वनाचें स्वरूप यावें त्याप्रमाणें हा भाग जंगली बनला आहे असें पदोपदीं वाटतें. शेवटी एकदां सिगीरीया गांव लागलें. उजव्या हाताला सुंदर बागबगीच्यानें शोभणारें नीटनेटकें टुमदार विश्रांतिगृह लागलें. तें टाकून अर्धा अधिक मैल पुढे गेलों तोंच त्या एकाकी प्रचंड खडकाच्या टेकडीशीं आलों. तेथें पायथ्याच्या दरवाजाशीं सरकारी मार्गदर्शक उभा होता. किल्ल्याच्या खऱ्या व बिकट चढावाला सध्यां लोखंडी कुलपाचें फाटक कैलें असल्यामुळे या मार्गदर्शकास प्रवेशद्वाराशीं किल्ल्या घेऊन प्रवाशाची मार्गप्रतीक्षा करीत उभे राहावें लागतें. हा खडक ग्रानाईट जातीचा तांबूस-रंगी आहे. पण हजारों वर्षे पाऊस, पाणी, थंडी व बारा खाऊन हा काळा पडला आहे. माथ्याजवळ मात्र त्याचा तांबूस रंग अजून राहिला आहे.
{{gap}}प्रवेशाच्या दाराच्या खांबापासून बांधलेल्या पायऱ्या लागतात. सभोंवार उंच उंच झाडें व प्रचंड राक्षसी धोंडे (Boulders) इतस्ततः पडलेले दृष्टोत्पत्तीस येतात. मधून मधून दगडी खांब, चवथरे व इमारती दगड व घडलेले अर्धवट मोडलेले तुटलेले छिन्नविछिन्न मूर्तीचे तुकडे वाटोवाट दिसतात. हीं सर्व चिन्हें गतकाळच्या वैभवशाली राजवटीचें दीनवाणीनें प्रवाशांस जणूं कांहीं स्मरण करून देत आहेत असा चढतांना भास होतो. टेकडीची पहिली मजगी चढून गेलें म्हणजे डाव्या हातास प्रचंड खडकचे खडक खोदकाम केलेलें दृष्टीस पडलें. वर जाऊन पाहतों तों एका मोठ्या खड-<noinclude></noinclude>
01mffpxsa6hnrm2rfvi1fe6zp2twazm
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८५
104
111904
236207
2026-08-26T07:28:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236207
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||खडक-देऊळ व खडक-किल्ला|७१ }}</noinclude>कांत खोदलेली स्नानाची सुंदर पुष्करणी आहे असें दिसून आलें. अर्थात् त्यांत आतां पाणी नव्हतें. कारण खडकाला बारिक चिरा पडल्या होत्या. त्याच्या जवळच्या खडकाला उंच जोतेवजा भाग खोदलेला असून मध्यें सिंहासनासारखी उंच दगडी बैठक होती व चवथाऱ्याच्या खालीं बऱ्याच मोठ्या दालनासारखी जागा होती. सभोंवार खडकांत भोके होतीं. यावरून येथें तात्पुरता मंडप किंवा तंबू देत असावे व हें स्नानगृह व बैठकगृह राजाकरितां केलेलें असावें असें वाटलें; कारण या गिरीशिखरावरून कश्यपराजा अठरा वर्षे राज्य करीत होता, हे पुढील ऐतिहासिक हकीगतीवरून कळून येईल. ही या डोंगराची पहिली मजगी होय. येथपर्यंत चढाव सुलभ असून येथे थोडीशी तरी सपाट जागा आहे. आतां या सपाटीवर उंच उंच झाडें झालीं आहेत. पण खरा सुळक्यासारखा काळा तांबडा एकसंधी खडक येथूनच लागतो. याच्या आकाराचे स्वरूप सांगणे कठीण आहे. पण अतिशयोक्तीची थट्टा करण्याकरितां सांगितलेल्या गोष्टींतील प्रचंड लांबट पण खुबजाड अशा राक्षसी वांग्याचीच उपमा या खडकाला शोभेल. त्या वांग्याप्रमाणें हा खडक काळसर तांबूस रंगाचा आहे; त्याचें मधले अंग किंचित् फुगीर आहे; त्यावर पाऊल ठेवायला सुद्धां जागा नाहीं असा हा खडक दुर्गम नव्हे तर अक्षरशः अगम आहे यांत शंका नाहीं. पण पूर्वकालीन एका राजाच्या इच्छेनुरूप त्याच्या शिल्पशास्त्रज्ञ सल्लागारांनीं हा अगम खडक त्या काळीं सुगम केला व त्या खडकाच्या माथ्यावर सुंदर राजवाडा बांधून या गिरीशिखरावर परिवारासह राजाला राहण्याची सोय केली, व या अगम ठिकाणीं राजानें आपल्या आयुष्याचीं अठरा वर्षे काढलीं व येथूनच सर्व राज्याचा कारभार हांकला. तेव्हां ही कृति जगांतील आठवें आश्चर्य नव्हें काय? हें आश्चर्यकारक काम कसें केलेलें होतें तें आतां प्रत्यक्ष पाहूं या.
{{gap}}या किंचित् सपाटीच्या मजगीपासून आपल्याला चुन्याविटांची दोन्ही बाजूस साधारण कठड्याप्रमाणे बांधलेली भिंत दिसते व मध्यें पांढऱ्या दग-<noinclude></noinclude>
bh2p1kxorthe6hbsolgueypfy4jf9la
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८६
104
111905
236208
2026-08-26T07:31:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236208
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|७२ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>डाच्या पायऱ्या दिसतात. पहिल्या पायरीच्या दोन्ही बाजूंस बरेंच रुंद विट काम दिसतें. आतां त्यावरचा चुन्याचा गिलावा पार गेला आहे; पण जरा बारकाईने पाहिलें कीं त्या विटकामावरून व अवशिष्ट राहिलेल्या गिलाव्यावरून येथें प्रचंड सिंहाच्या मोठ्या जबड्याचे चित्र चुन्याच्या गिलाव्यांत केलें होतें असें कळून येतें व या खडक-किल्ल्याला 'सिगिरीया ' (मूळ संस्कृत सिंहगिरी) कां नांव देण्यांत आलें हें स्पष्टपणे कळतें व हें ठिकाण बनविणाऱ्या शिल्पकाराच्या कौशल्याचें विलक्षण कौतुक वाटतें. एखाद्या राजवाड्याला जसा गिलाव्यानें गुळगुळीत केलेला सुंदर चित्रांनीं व नाजुक नक्षीकामानें सुशोभित केलेला जिना असावा तसा जिना या सिंहाच्या जबड्यांतून केला आहे असें वाटतें. पण हा जिना चढू लागलें म्हणजे त्या खडकाचा भीषणपणा ध्यानांत येतो. कारण जरा चढल्याबरोबर उजव्या बाजूला डोक्यावर लोंबणाऱ्या निसरड्या खडकाखेरीज कांहीं एक नाहीं असें ध्यानांत येतें. डाव्या बाजूस मात्र विटांची गुळगुळीत गिलाव्याची कठड्यासारखी छातीभर उंच भिंत लागते. पण पुढे हा जिना एकाएकीं संपलेला व तुटलेला दिसतो व या खडकाचें भीषण स्वरूप ध्यानांत येऊन घेरी आल्यासारखें वाटतें. कारण आपला जिना अधांत्रीं असून डाव्या हातास खोल खोल दरी व उजव्या हातास भिंतीसारखा खडकच आहे असें दिसतें. मग या राजवाड्याच्यासारख्या सुगम जिन्याच्या कौशल्याच्या कृतीनें मन थक्क होऊन जातें. या भिंतीसारख्या खडकाला फूट दोन फुटाची भिंत बांधतां येईल अशा अंतरावर खडकांत दोन दोन भोकें थोड्या थोड्या अंतरावर केलेलीं दृष्टीस पडतात व या जिन्याच्या कृतीचें कसब ध्यानांत येतें. या भोकांत लोखंडी किंवा लाकडी गज घट्ट न निसटतील अशा तऱ्हेनें बसविले असले पाहिजेत; व मग त्या गजांना भिंतींत बुजवून पण त्या गजांचे आधारावर जिन्याची चढती चढती भिंत बांधीत आणली असली पाहिजे. अशी भिंत बांधीत आणल्यावर खडक व भिंत यांचेमध्यें जी दोन चार फूट जागा झाली त्यांत पायऱ्या<noinclude></noinclude>
5z0ijkl0t4tkvmvnr8gz38qgprmrqme
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८७
104
111906
236209
2026-08-26T07:34:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236209
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|'''खडक किल्ल्यावर जाण्याचा जिना, सिगिरिया.'''}}
{{rh|नं. ८||पान ७२}}
{{nop}}<noinclude></noinclude>
nmeulc44fx8btvwlck66vre1lifcsx6
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८८
104
111907
236210
2026-08-26T07:38:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236210
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||खडक-देऊळ व खडक-किल्ला|७३ }}</noinclude>बांधून काढल्या असल्या पाहिजेत, हें या ठिकाणीं तुटलेल्या जिन्याच्या खिंडारांतून दिसून येतं. या तुटलेल्या ठिकाणीं आतां पुराणवस्तु संरक्षक खात्यानें लोंबती लोखंडी कठड्यांची ग्यालरी केली आहे. ही ग्यालरी एकाच सपाटीवर केली असून मग लहानशी शिडी केली आहे. पुनः जुना जिना थोडासा शाबूत आहे. पुढे जिना किंवा ग्यालरी कांहीं एक नाहीं; आणि अर्धा अधिक खडकाचा भीषण भाग तर जणू कांहीं आ पसरून बसलेला आपल्यापुढें ठाकतो. येथून तर जाणें अशक्यच झालें असतें; पण आतां लोखंडी गजांचा चढता मजबूत कठडा डोंगराच्या माथ्यापर्यंत करण्यांत आला आहे व त्या बिकट व उभ्या खडकांत बरोबर चार इंचाच्या आपलें एकच पाऊल राहील अशा खोबणी केल्या आहेत. तेव्हां हा भाग सध्यां चढावयाचा म्हणजे डाव्या हातानें कठडा घट्ट धरावयाचा व एक एक पाऊल त्या खोबणींत ठेवावयाचें; जास्त भीति वाटल्यास व जास्त अवघड चढाव वाटल्यास उजवा हात खडकावर टेकावयाचा व मग मुलाप्रमाणें रांगत चालावयाचें! अशा तऱ्हेनें या खडकाचे माथ्यावर जातां येतें. माझ्यासारख्या पुष्कळ प्रवास केलेल्या व उंच उंच डोंगर, गिरीशिखरें व किल्ले चढलेल्या माणसाचें या दुर्गम- नव्हे अगम- वाटेने जातांना डोळे फिरल्यासारखे झाले व घेरी येते कीं काय असें वाटलें. पण मनाचा हिय्या करून व आतां थोडाच भाग राहिला असा मनाला धीर देत शेवटीं एकदां मी या विलक्षण खडकाच्या माथ्याशीं आलों. मग तेथून पुनः जिना व दगडी पायऱ्या लागल्या यामुळे जीवांत जीव आला व आज आपण एका दिव्यांतून बाहेर पडलों असें वाटलें. शेवटी एकदां माथ्यावरील पठारावर आलों; पण तेथें काय आहे? तेथें राजवाडा नाहीं, किल्ला नाहीं, किल्ल्याची तटबंदी नाहीं. आतां जुन्या कृतींपैकीं कांहीं एक राहिलें नाहीं. फक्त जिकडे तिकडे मोडके तोडके घडलेले दगड, अर्धवट विसकलेली फरशी, विटांच्या जोत्याचे अवशेष, एक पाण्याचें बरेंच मोठें टाकें- येवढ्याच गोष्टी दृष्टीस<noinclude></noinclude>
cb0b147nfxo7ztj5quhimp4p6jh9zcj
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८९
104
111908
236211
2026-08-26T07:42:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236211
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|७४ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>पडतात. या खडकाच्या एक दोन गुहांमध्यें अजिंठ्याच्या लेण्यांतल्या प्रमाणें उत्तम चित्रकलेचे मासले असलेली रंगीत चित्रे भिंतीवर पक्क्या रंगांत काढलेली आहेत. पण मार्गदर्शकानें कामांत चुकारपणा करून तेथें मला नेलें नाहीं हें मागाहून कळले. पश्चात् ''''बुद्धि बामणिया'''' असा माझा प्रकार झाला खरा; पण कोलंबोस परत आल्यावर कोलंबोच्या पदार्थसंग्रहालयांत सिगिरिया गुहेतील रंगीत चित्रांच्या हुबेहुब नकला मला स्वस्थपणे पहावयास सांपडल्या येवढ्यावरच मी मनाचें समाधान करून घेतलें.
{{gap}}पण सभोवारचा हिरवागार व म्हणूनच नयनमनोहर देखावा मात्र मनाला फार आनंद देणारा आहे यांत शंका नाहीं. जीवापाड मेहनत करून या दुर्गम स्थळी आल्याचें सार्थक झाले अशा प्रकारचेंच माझ्या मनाला समाधान वाटलें. हा खडक अगर डोंगर सपाट भागांत एकाकीच उभा आहे असें दिसतें. भूगर्भशास्त्रदृष्ट्या हा एक अलौकिक चमत्कारच होय. जिकडे तिकडे सपाटच्या सपाट प्रदेश दिसतो व तो सर्व हिरव्यागार रानानें व्याप्त आहे असें दृष्टोत्पत्तीस येतें; मधून मधून पांढऱ्या शुभ्र पाण्यानें तुडुंब भरलेले तलाव दृष्टीस पडतात व हा हिरव्या पांढऱ्या रंगाचा विरोध विस्मयकारक वाटतो. पण या तलावावरून पूर्वीच्या राजवटींत हा सर्व भाग भातशेतीसारख्या धान्यपिकांनी व केळी नारळासारख्या फळ- पिकांनीं सदा शोभिवंत दिसत असला पाहिजे असें कळून येऊन लंकेच्या पूर्वकाळच्या वैभवाचें व प्रगतीचं कौतुक वाटल्यावांचून रहात नाहीं. अशा प्रकारचे नाना विचारतरंग येथे उभे असतांना मनांत उभे राहिले. पण आतां बराच वेळ झाला. ठिकाणास परत जाण्यास उशीर होईल या भयानें मी या सुंदर गिरीशिखरावरून आलेल्या दुर्गम मार्गानें परत खाली आलों व मग मोटारीत बसून पाहिलेल्या अपूर्व स्थळाचें आश्चर्यचकित मनानें मनन करीत गांवच्या विश्रांतिगृहाला येऊन पोहोचलों. हें आठवें आश्चर्य निर्माण करविणाऱ्या राजाची हकीकत येथें देणें अयोग्य होणार नाहीं.{{nop}}<noinclude></noinclude>
gdzvbcyu0sh22wbf6p0fsumwz5trn61
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९०
104
111909
236212
2026-08-26T07:43:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{{gap}}अगम खडकाला सुगम बनवून तेथें बांधकला, मूर्तिकला व चित्रकला यांच्या ललितकलाकृतीचें जणूं कांहीं प्रदर्शन भरविणाऱ्या कलाप्रिय राजाचें चरित्र मात्र नैतिकदृष्ट्या ओंगळ व कुरूप..."
236212
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||खडक-देऊळ व खडक-किल्ला|७५ }}</noinclude>{{gap}}अगम खडकाला सुगम बनवून तेथें बांधकला, मूर्तिकला व चित्रकला यांच्या ललितकलाकृतीचें जणूं कांहीं प्रदर्शन भरविणाऱ्या कलाप्रिय राजाचें चरित्र मात्र नैतिकदृष्ट्या ओंगळ व कुरूप अर्थात् अनीतिमान् असें आहे याचें राहून राहून आश्चर्य वाटतें. सिगिरिया दुर्ग बांधणारा पहिला कश्यप राजा हा प्रख्यात धातुसेन राजाच्या असवर्ण राणीपासून झालेला राजपुत्र होय. थोरला राजपुत्र मोगलान हा सवर्ण राणीपासून झालेला युवराज होता. पण कश्यपाला राज्याचा लोभ उत्पन्न झाला. तेव्हां त्यानें आपल्या बापाच्या सेनापतीला वश करून घेऊन बंडाचे निशाण उभारलें व धातुसेनाला कैद करून आपण राज्यावर बसला. पुढें बापाच्या खजिन्याच्या लोभानें कश्यपानें सेनापतीच्या नादीं लागून बापाचे हाल करून त्याला जीवंत भिंतींत चिणलें. थोरल्या भावाची. तीच अवस्था करण्याचा त्याचा मानस होता. पण मोगलान हिंदुस्था- •नांत पळून गेला व तेथें त्यानें आपलें राज्य परत मिळविण्याकरितां सैन्याची जुळवाजुळव सुरू केली. कश्यपाचें पापी मन ही बातमी ऐकून घाबरून गेलें. म्हणून त्यानें आपली अनुराद्धपूर राजधानी सोडली व सिगिरियाच्या अगम खडकावर किल्ला व राजवाडा बांधण्याचा बेत केला. त्यानें आपल्या पदरच्या शिल्पशास्त्रकलानिपुण नोकरां- कडून सिगिरीयाचें आठवें आश्चर्य निर्माण केलें. येथून त्यानें १८ वर्षे निर्धास्तपणें राज्याकारभार चालविला. पण मोगलान कांहीं स्वस्थ बसला नव्हता. त्याने मोठ्या सैन्यानिशीं येऊन लंकेवर स्वारी केली व अनुराद्धपुर राजधानी काबीज केली. नंतर तो सिगिरिया किल्याला वेढा देऊन बसला. आतां आपली धड- गत नाहीं असें पाहून कश्यपानें आत्महत्या करून घेतली! याप्रमाणें अन्यायाने व अघोरपणानें मिळविलेलें राज्य कश्यपानें नरकवासाला नेणाऱ्या आत्महत्येसारख्या पापकर्मानें घालविलें ! पापाचा शेवट पापांत व्हावयाचा र्हेच खरें. त्याप्रमाणें कश्यप राजाची अवस्था झाली. कोठें कश्यपाची आश्चर्यानें मन थक्क करून टाकणारी व आठवें<noinclude></noinclude>
i4r7y9rzkfdsly3zlab3528sihjdw9e
236214
236212
2026-08-26T07:47:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236214
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||खडक-देऊळ व खडक-किल्ला|७५ }}</noinclude>{{gap}}अगम खडकाला सुगम बनवून तेथें बांधकला, मूर्तिकला व चित्रकला यांच्या ललितकलाकृतीचें जणूं कांहीं प्रदर्शन भरविणाऱ्या कलाप्रिय राजाचें चरित्र मात्र नैतिकदृष्ट्या ओंगळ व कुरूप अर्थात् अनीतिमान् असें आहे याचें राहून राहून आश्चर्य वाटतें. सिगिरिया दुर्ग बांधणारा पहिला कश्यप राजा हा प्रख्यात धातुसेन राजाच्या असवर्ण राणीपासून झालेला राजपुत्र होय. थोरला राजपुत्र मोगलान हा सवर्ण राणीपासून झालेला युवराज होता. पण कश्यपाला राज्याचा लोभ उत्पन्न झाला. तेव्हां त्यानें आपल्या बापाच्या सेनापतीला वश करून घेऊन बंडाचे निशाण उभारलें व धातुसेनाला कैद करून आपण राज्यावर बसला. पुढें बापाच्या खजिन्याच्या लोभानें कश्यपानें सेनापतीच्या नादीं लागून बापाचे हाल करून त्याला जीवंत भिंतींत चिणलें. थोरल्या भावाची तीच अवस्था करण्याचा त्याचा मानस होता. पण मोगलान हिंदुस्थानांत पळून गेला व तेथें त्यानें आपलें राज्य परत मिळविण्याकरितां सैन्याची जुळवाजुळव सुरू केली. कश्यपाचें पापी मन ही बातमी ऐकून घाबरून गेलें. म्हणून त्यानें आपली अनुराद्धपूर राजधानी सोडली व सिगिरियाच्या अगम खडकावर किल्ला व राजवाडा बांधण्याचा बेत केला. त्यानें आपल्या पदरच्या शिल्पशास्त्रकलानिपुण नोकरांकडून सिगिरीयाचें आठवें आश्चर्य निर्माण केलें. येथून त्यानें १८ वर्षे निर्धास्तपणें राज्याकारभार चालविला. पण मोगलान कांहीं स्वस्थ बसला नव्हता. त्याने मोठ्या सैन्यानिशीं येऊन लंकेवर स्वारी केली व अनुराद्धपुर राजधानी काबीज केली. नंतर तो सिगिरिया किल्याला वेढा देऊन बसला. आतां आपली धडगत नाहीं असें पाहून कश्यपानें आत्महत्या करून घेतली! याप्रमाणें अन्यायाने व अघोरपणानें मिळविलेलें राज्य कश्यपानें नरकवासाला नेणाऱ्या आत्महत्येसारख्या पापकर्मानें घालविलें! पापाचा शेवट पापांत व्हावयाचा हेच खरें. त्याप्रमाणें कश्यप राजाची अवस्था झाली. कोठें कश्यपाची आश्चर्यानें मन थक्क करून टाकणारी व आठवें<noinclude></noinclude>
7hjpcbyyniai8hndi32ea0vixjpqr54
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९१
104
111910
236213
2026-08-26T07:45:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236213
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|७६ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>आश्चर्य होण्यायोग्य ललितकलाकृती! व कोठें त्याची पितृवधासारखी अमानुष पापकृती! कोठें तीं गुहेतील सदा आनंद देणारीं चित्रे व कोठें कश्यपाची भेदरलेल्या मनःस्थितीची द्योतक आत्महत्येची कृति! मानवी कृतींतील व चरित्रांतील हा विरोध म्हणजे एक जगांतील अनिर्वचनीय गूढ होय! याचा उलगडा करण्याची शक्ति मानवी मनाला नाहीं हे खास. अशा प्रकारचे विचार कश्यप राजाच्या विरोधी व विसंवादी वागणुकीनें माझ्या मनांत उभे राहिले. सिगिरिया किल्ल्याचें हे दुःखपर्यवसायी पुराण येथें पुरें करणें बरें.

{{rule|5em}}{{rule|7em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
tpagm2skjqgb6ih68iu0jkvanyigk7i
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९२
104
111911
236215
2026-08-26T07:47:37Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ प्रकरण ६ वें बॅटिकोला व त्रिंकोमाली. सिलोनचा पूर्व किनारा पश्चिम किनाऱ्याप्रमाणें अर्वाचीन सुधार- "लेल्या दळणवळणाच्या साधनानीं, लोकवस्तीनें व नव्या नव्या पिकांच्या ला..."
236215
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
प्रकरण ६ वें
बॅटिकोला व त्रिंकोमाली.
सिलोनचा पूर्व किनारा पश्चिम किनाऱ्याप्रमाणें अर्वाचीन सुधार- "लेल्या दळणवळणाच्या साधनानीं, लोकवस्तीनें व नव्या नव्या पिकांच्या लागवडीनें संपन्न झालेला नाहीं. अजून या पूर्वबाजूला अरण्य- मय, बिनलागवडीचा खाजगी मालकीचा व बिनवस्तीचा भाग पुष्कळ आहे. पण या किनान्यावर दोन शहरें पुष्कळ पुरातन काळापासून वस- लेलीं व प्रसिद्धीस आलेलीं आहेत. ती शहरें म्हणजे त्रिंकोमाली व बॅटीकोला हीं होत. यांपैकीं त्रिंकोमाली हें नांव हिंदुस्थानचा इतिहास व भूगोल मराठी शाळेत शिकतांना विद्यार्थीदशेपासून मला श्रुतिपरिचित होतें. बॅटिकोला ऐकिवांत नव्हतें व माझ्या प्रथम आंखलेल्या लंकाप्रवास- कार्यक्रमांत तें शहर नव्हतें, पण तें शहर पाहण्याचा सहजासहजी योग आला तो असा.
{{gap}}
मी खडक-देऊळ व खडक - किल्ला पाहून पराक्रमबाहू नांवाच्या सिंहली राजाच्या कारकीर्दीत वैभवशिखरास पोहोंचलेल्या 'पोलनरूवा नांवाच्या जुन्या राजधानीस गेलों. तेथून त्रिंकोमालीस गेलों व तेथून बॅटिकोला शहरास जाऊन एक दिवसानंतर त्रिंकोमालीस परत आलों. पोलनरूवा ही जुनी राजधानी तिच्याहीपेक्षां जास्त जुनी राजधानी अनुराद्धपुर व त्यांचेही पूर्वीचें प्रसिद्ध पवित्र स्थळ मिहिंतले पर्वत यांचें एकत्र वर्णन मी पुढील प्रकरणांत करणार आहे. या प्रकरणांत बॅटिकोला व त्रिंकोमाली या प्रेक्षणीय शहरांचें वर्णन यथाक्रम करतों.
{{gap}}

मी पोलनरूवा येथून मोटारनें त्रिंकोमालीस गेलों. हा सर्व मार्ग रानावनांतून गेला असल्यामुळे, वस्ती व गांवें फार तुरळक तुरळकच<noinclude></noinclude>
1mkyxtjfvwwvniref7iazzhyjqz9yx5
236218
236215
2026-08-26T10:46:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236218
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ६ वें'''}}}}
{{rule|7em}}
{{center|{{x-larger|'''बॅटिकोला व त्रिंकोमाली.'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}{{x-larger|'''सि'''}}'''लोन'''चा पूर्व किनारा पश्चिम किनाऱ्याप्रमाणें अर्वाचीन सुधारलेल्या दळणवळणाच्या साधनानीं, लोकवस्तीनें व नव्या नव्या पिकांच्या लागवडीनें संपन्न झालेला नाहीं. अजून या पूर्वबाजूला अरण्यमय, बिनलागवडीचा खाजगी मालकीचा व बिनवस्तीचा भाग पुष्कळ आहे. पण या किनाऱ्यावर दोन शहरें पुष्कळ पुरातन काळापासून वसलेलीं व प्रसिद्धीस आलेलीं आहेत. ती शहरें म्हणजे त्रिंकोमाली व बॅटीकोला हीं होत. यांपैकीं त्रिंकोमाली हें नांव हिंदुस्थानचा इतिहास व भूगोल मराठी शाळेत शिकतांना विद्यार्थीदशेपासून मला श्रुतिपरिचित होतें. बॅटिकोला ऐकिवांत नव्हतें व माझ्या प्रथम आंखलेल्या लंकाप्रवास कार्यक्रमांत तें शहर नव्हतें, पण तें शहर पाहण्याचा सहजासहजी योग आला तो असा.
{{gap}}मी खडक-देऊळ व खडक-किल्ला पाहून पराक्रमबाहू नांवाच्या सिंहली राजाच्या कारकीर्दीत वैभवशिखरास पोहोंचलेल्या ''''पोलनरूवा'''' नांवाच्या जुन्या राजधानीस गेलों. तेथून त्रिंकोमालीस गेलों व तेथून बॅटिकोला शहरास जाऊन एक दिवसानंतर त्रिंकोमालीस परत आलों. पोलनरूवा ही जुनी राजधानी तिच्याहीपेक्षां जास्त जुनी राजधानी अनुराद्धपुर व त्यांचेही पूर्वीचें प्रसिद्ध पवित्र स्थळ मिहिंतले पर्वत यांचें एकत्र वर्णन मी पुढील प्रकरणांत करणार आहे. या प्रकरणांत बॅटिकोला व त्रिंकोमाली या प्रेक्षणीय शहरांचें वर्णन यथाक्रम करतों.
{{gap}}मी पोलनरूवा येथून मोटारनें त्रिंकोमालीस गेलों. हा सर्व मार्ग रानावनांतून गेला असल्यामुळे, वस्ती व गांवें फार तुरळक तुरळकच<noinclude></noinclude>
l2bkqcy6pbvt9reh9i5yyiejpb0xdof
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९३
104
111912
236216
2026-08-26T07:47:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "लागतात. पोलनरूवा येथून सकाळी साताच्या सुमारास निघालों तों नवाचे आधी हानें गांवीं २८ मैल आलों. येथें अर्धातास थांबावें लागलें. याच गांवीं मीं एक छोटेसें नवें हिंदु शिवालय पाहिले..."
236216
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|७८ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>लागतात. पोलनरूवा येथून सकाळी साताच्या सुमारास निघालों तों नवाचे आधी हानें गांवीं २८ मैल आलों. येथें अर्धातास थांबावें लागलें. याच गांवीं मीं एक छोटेसें नवें हिंदु शिवालय पाहिलें. त्यांत मागें उल्लेखिल्याप्रमाणें बुद्धाची मूर्ति पाहिली. अर्ध्यापाऊण तासानें मातलेहून त्रिंकोमालीस जाणारी मोटार आली व त्यांत बसून मी त्रिंकोमालीस बारा वाजतां पोहोचलों. सर्व वाटभर रानच रान ! कांहीं भुरटे व कांहीं उंच उंच वृक्षांनी बनलेलें असें दुतर्फा सारखें लागत होतें. या भागांत लागवड अगदीं नाहींच म्हणाना! मात्र त्रिंकोमालीच्या वीस मैल आधीं भला मोठा कांतलाई नांवाचा तलाव लागला. गाडीरस्ता या तलावाच्या मातीच्या बंधाऱ्यावरून एक मैलभर जातो. केवढा मोठा प्रचंड तो बंधारा ! किती तरी रुंद; पण तो सर्व मातीचा आहे. येवढ्या मातीचा लांब-रुंद तलाव करण्याला त्या जुन्या काळीं लाखो माणसांची आंगमेहनत कित्येक वर्षे लागली असली पाहिजे. हा तलाव पाहिला कीं भाटघरच्या प्रचंड तलावाची आठवण होते. हल्लीं गाडीरस्ता या तलावाच्या दगडी भिंतीच्या कठड्याच्या मधूनच नेला आहे; व तो एक मैलच आहे. अर्थात् अर्वा- चीन बंधारा सर्व चुना दगड सिमेंट यांनी बांधलेला आहे पण जवळ जवळ येवढाच मोठा कांतलाई तलाव मातीच्या बंधानें केलेला असून तो हजारों वर्षे टिकला आहे. हैं जुन्या काळचें प्रचंड काम पाहून मन आश्चर्यानें थक्क झालें. येथून खरोखरीं फारच रमणीय देखावा दिसतो. या तलावाच्या आसपास थोडी भातशेती व बागाईती आहे. पण पुढें पुनः रानावनाचा प्रदेश लागतो तो त्रिंकोमाली गांवांत शिरेपर्यंत सरत नाहीं.
{{gap}}
त्रिंकोमालीस मी रा. बालसिंघम् या नांवाच्या सुशिक्षित सुधारलेल्या तामीळ गृहस्थाकडे (हे गृहस्थ अबकारी खात्यांतील सुपरिंटेंडेंटच्या दर्जाचे मोठे अंमलदार आहेत ) उतरणार होतों. त्यांना रा. कंदिया यांनीं पेरेडॅनीयाहून पत्र लिहिलें होतें व पोलनरूवाहून मी तार केली होती. मोटार- स्टँडवर आल्यावर मला तेथे उतरून त्यांचे विन्हाडीं जावयाचें होतें. पण मला हमालाची भाषा येत नव्हती, म्हणून मीं मोटार ड्रायव्हरला इंग्रजीत<noinclude></noinclude>
mn2lmjqxseq27xm98z6j4ymvnzin4if
236219
236216
2026-08-26T10:54:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236219
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|७८ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>लागतात. पोलनरूवा येथून सकाळी साताच्या सुमारास निघालों तों नवाचे आधी हाबनें गांवी २८ मैल आलों. येथें अर्धातास थांबावें लागलें. याच गांवीं मीं एक छोटेसें नवें हिंदु शिवालय पाहिलें. त्यांत मागें उल्लेखिल्याप्रमाणें बुद्धाची मूर्ति पाहिली. अर्ध्यापाऊण तासानें मातलेहून त्रिंकोमालीस जाणारी मोटार आली व त्यांत बसून मी त्रिंकोमालीस बारा वाजतां पोहोचलों. सर्व वाटभर रानच रान! कांहीं भुरटे व कांहीं उंच उंच वृक्षांनी बनलेलें असें दुतर्फा सारखें लागत होतें. या भागांत लागवड अगदीं नाहींच म्हणाना! मात्र त्रिंकोमालीच्या वीस मैल आधीं भला मोठा '''कांतलाई''' नांवाचा तलाव लागला. गाडीरस्ता या तलावाच्या मातीच्या बंधाऱ्यावरून एक मैलभर जातो. केवढा मोठा प्रचंड तो बंधारा! किती तरी रुंद; पण तो सर्व मातीचा आहे. येवढ्या मातीचा लांब-रुंद तलाव करण्याला त्या जुन्या काळीं लाखो माणसांची आंगमेहनत कित्येक वर्षे लागली असली पाहिजे. हा तलाव पाहिला कीं भाटघरच्या प्रचंड तलावाची आठवण होते. हल्लीं गाडीरस्ता या तलावाच्या दगडी भिंतीच्या कठड्याच्या मधूनच नेला आहे; व तो एक मैलच आहे. अर्थात् अर्वाचीन बंधारा सर्व चुना दगड सिमेंट यांनी बांधलेला आहे पण जवळ जवळ येवढाच मोठा कांतलाई तलाव मातीच्या बंधाऱ्यानें केलेला असून तो हजारों वर्षे टिकला आहे. हे जुन्या काळचें प्रचंड काम पाहून मन आश्चर्यानें थक्क झालें. येथून खरोखरीं फारच रमणीय देखावा दिसतो. या तलावाच्या आसपास थोडी भातशेती व बागाईती आहे. पण पुढें पुनः रानावनाचा प्रदेश लागतो तो त्रिंकोमाली गांवांत शिरेपर्यंत सरत नाहीं.
{{gap}}त्रिंकोमालीस मी रा. बालसिंघम् या नांवाच्या सुशिक्षित सुधारलेल्या तामीळ गृहस्थाकडे (हे गृहस्थ अबकारी खात्यांतील सुपरिंटेंडेंटच्या दर्जाचे मोठे अंमलदार आहेत) उतरणार होतों. त्यांना रा. कंदिया यांनीं पेरेडॅनीयाहून पत्र लिहिलें होतें व पोलनरूवाहून मी तार केली होती. मोटार- स्टँडवर आल्यावर मला तेथे उतरून त्यांचे बिऱ्हाडीं जावयाचें होतें. पण मला हमालाची भाषा येत नव्हती, म्हणून मीं मोटार ड्रायव्हरला इंग्रजीत<noinclude></noinclude>
egk56b5aunawo1udlg7zmc6bss3slk0
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९४
104
111913
236217
2026-08-26T07:48:17Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सांगितलें व त्यानें हमालाला तामीळमध्यें “ अबकारी अंमलदाराकडे न" म्हणून सांगितलें. हमाल गांवांतील दुसऱ्याच अंमलदाराकडे मला नेऊं लागला होता है मला वाटेने जाणाऱ्या गृहस्थाशीं बा..."
236217
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|७९ }}</noinclude>सांगितलें व त्यानें हमालाला तामीळमध्यें “ अबकारी अंमलदाराकडे न" म्हणून सांगितलें. हमाल गांवांतील दुसऱ्याच अंमलदाराकडे मला नेऊं लागला होता है मला वाटेने जाणाऱ्या गृहस्थाशीं बालसिंघमची चवकशी करतां कळलें.
{{gap}}
पाऊस तर धोधो पडूं लागला. बालसिंघमचा बंगला किल्ल्यांत आहे व येथून तो अर्धा मैल लांब आहे असें कळलें. तेव्हां शेजारी असलेल्या विश्रांतिगृहांत मी जाण्याचा बेत केला. त्याचवेळीं सुदैवानें अबकारी खात्यांतील एक शिपायी भेटला. तेव्हां बालसिंघमना मी विश्रांतिगृहांत उतरल्याचे कळवा असें त्या शिपायास सांगितलें व मग मी विश्रांति- गृहांत गेलों. प्रवास करीत असलेल्या देशाची भाषा येत नसली म्हणजे केव्हां केव्हां कशी फजिती होते याचा मला चांगला अनुभव आला. पण माझें जेवण आटोपून मी इकडे तिकडे पहात होतों तोंच बालसिंघ- मकडून मोटार आली व त्यांत बसून मी त्यांचे बंगल्यावर गेलो.
{{gap}}
त्यांनीं पूर्वीची ओळख नसतांना मोठ्या आदरानें व आनंदानें माझें स्वागत केलें ; मग ते म्हणाले “दुसरे दिवशीं सकाळींच मला माझ्या मुलीला आणण्याकरितां बॅटिकोला शहराला जावयाचें आहे; तेव्हां तुम्हीही चला; तुम्हाला तें शहर पाहण्यास सांपडेल. " प्रवासाच्या आराखडयांत नसलेलें प्रेक्षणीय शहर पाहण्याचा अनायासें योग येत आहे असें पाहून मीं मोठ्या आनंदानें त्यांच्या म्हणण्यास रुकार दिला. अशा तन्हेनें त्रिंकोमालीचे आधींच माझें बाटिकोला शहर पाहून झाले, म्हणून त्याचेंच वर्णन आधीं देतो.
{{gap}}
त्रिंकोमालीपासून बॅटिकोला हें दक्षिण दिशेला ऐशी मैल दूर आहे. पूर्व किनान्यानें तेथें जाण्यास चांगला रस्ता आहे खरा; पण वाटेंत चार पांच खाड्या तरीनें उतराव्या लागतात; म्हणून बालसिंघमची स्वतःची मोटार असतांना ते मोटारनें न जातां आगगाडीनें जाणार होते. वॅटिकोलाला जाणारा आगगाडीचा रस्ता म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या 'दोन बाजू होत. या आगगाडीच्या रस्त्यानें त्रिंकोमालीहून बॅटिकोला<noinclude></noinclude>
am1rg87d261udb446bol35hrr4gvq1n
236220
236217
2026-08-26T10:57:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236220
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|७९ }}</noinclude>सांगितलें व त्यानें हमालाला तामीळमध्यें “अबकारी अंमलदाराकडे न" म्हणून सांगितलें. हमाल गांवांतील दुसऱ्याच अंमलदाराकडे मला नेऊं लागला होता हे मला वाटेने जाणाऱ्या गृहस्थाशीं बालसिंघमची चवकशी करतां कळलें.
{{gap}}पाऊस तर धोधो पडूं लागला. बालसिंघमचा बंगला किल्ल्यांत आहे व येथून तो अर्धा मैल लांब आहे असें कळलें. तेव्हां शेजारी असलेल्या विश्रांतिगृहांत मी जाण्याचा बेत केला. त्याचवेळीं सुदैवानें अबकारी खात्यांतील एक शिपायी भेटला. तेव्हां बालसिंघमना मी विश्रांतिगृहांत उतरल्याचे कळवा असें त्या शिपायास सांगितलें व मग मी विश्रांतिगृहांत गेलों. प्रवास करीत असलेल्या देशाची भाषा येत नसली म्हणजे केव्हां केव्हां कशी फजिती होते याचा मला चांगला अनुभव आला. पण माझें जेवण आटोपून मी इकडे तिकडे पहात होतों तोंच बालसिंघमकडून मोटार आली व त्यांत बसून मी त्यांचे बंगल्यावर गेलो.
{{gap}}त्यांनीं पूर्वीची ओळख नसतांना मोठ्या आदरानें व आनंदानें माझें स्वागत केलें; मग ते म्हणाले "दुसरे दिवशीं सकाळींच मला माझ्या मुलीला आणण्याकरितां बॅटिकोला शहराला जावयाचें आहे; तेव्हां तुम्हीही चला; तुम्हाला तें शहर पाहण्यास सांपडेल." प्रवासाच्या आराखडयांत नसलेलें प्रेक्षणीय शहर पाहण्याचा अनायासें योग येत आहे असें पाहून मीं मोठ्या आनंदानें त्यांच्या म्हणण्यास रुकार दिला. अशा तऱ्हेनें त्रिंकोमालीचे आधींच माझें बाटिकोला शहर पाहून झाले, म्हणून त्याचेंच वर्णन आधीं देतो.
{{gap}}त्रिंकोमालीपासून बॅटिकोला हें दक्षिण दिशेला ऐशी मैल दूर आहे. पूर्व किनाऱ्यानें तेथें जाण्यास चांगला रस्ता आहे खरा; पण वाटेंत चार पांच खाड्या तरीनें उतराव्या लागतात; म्हणून बालसिंघमची स्वतःची मोटार असतांना ते मोटारनें न जातां आगगाडीनें जाणार होते. बॅटिकोलाला जाणारा आगगाडीचा रस्ता म्हणजे काटकोन त्रिकोणाच्या दोन बाजू होत. या आगगाडीच्या रस्त्यानें त्रिंकोमालीहून बॅटिकोला<noinclude></noinclude>
mmvzo7kvxn8adcwj6rsnws0ww09ezi7
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९५
104
111914
236221
2026-08-26T11:13:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236221
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८० |लंकेच वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>१२० मैल पडते. सायंकाळीं मी बालसिंघमच्या घरीं राहण्यास आलों हे सांगावयास नको. सकाळीं न्याहारी करून व बरोबर जेवणाचें घेऊन आम्ही बॅटिकोलास जाण्यास निघालों. मोठे अंमलदार म्हणून बालसिंघम् पहिल्या वर्गानें प्रवास करणारे असल्यामुळे मलाही त्याच वर्गाचें तिकीट काढावें लागलें. सिलोनमधील पहिल्या वर्गाची व्यवस्था कशी असते हे या योगानें सहजीं पहावयास मिळणार होतें. ''''आठवडा अखेर'''' च्या परत तिकीटाला साडेबारा रुपये पडले. सिलोन रेल्वेचे पहिल्या वर्गाचे डबे हिंदुस्थानांतील रेल्वे प्रमाणेंच आहेत; पण आगगाडी मात्र सावकाश चालते. मला आमच्या जुन्या एम. एस. एम. च्या गाड्यांची आठवण झाली. '''गालोया''' जंक्शन स्टेशनला तर तीन साडेतीन तास थांबावें लागतें. यामुळे या आगगाडीच्या प्रवासाचा फार त्रास वाटतो. एकशेवीस मैलाच्या प्रवासाला दहा तास लागल्यासारखें होतें. मोटार रस्त्यानें येतांना ज्याप्रमाणे रस्त्याच्या दोन्ही बाजूंस घनदाट रानच रान लागतें त्याचप्रमाणें आगगाडीने जातांना लागतें. पण आगगाडीच्या रस्त्याला लागून दोन्ही बाजूंस बरीच जमिनीची पट्टी रान कापून खुली केल्यामुळे व आगगाडीच्या रुळाखालच्या लाकडी कड्या त्याच रानांतून काढल्या गेल्यामुळें आगगाडीनें जातांना किंचित् खुलास वाटतें व रानही तितकें घनदाट वाटत नाहीं. त्यामुळे मोटार गाडीनें जसा प्रवास भयाण अरण्याच्या बोगद्यांतून होत आहे असा भास होतो तसा हा आगगाडीचा प्रवास वाटत नाहीं. पोलनरूवा स्टेशन टाकल्यावर लवकरच महावेली गंगा या सिलोनमधील सर्वात मोठ्या नदीवरील पूल ओलांडून आगगाडी पुढे जाते. गंगानदी येथें बरीच रुंद व खोल असून प्रवाह दुथडी भरून वहात असतो. पूल व नदी यांचा येथला देखावा प्रेक्षणीय आहे. पुढें आगगाडी थेट पूर्वेकडे जाऊन समुद्रकांठाच्या बरीच जवळ येते. हा भाग समुद्रसपाटीवर असून बिलकूल उंच सखल नाहीं. या भागांत भात शेती व केळी नारळी यांच्या बागा दिसूं लागतात, तेव्हां रान टाकून वस्तीच्या व लागवडीच्या भागांत आलों असें कळून येतें.{{nop}}<noinclude></noinclude>
27ktibin19gcw4pcmc0gdokjm5d0w9r
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९६
104
111915
236222
2026-08-26T11:21:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236222
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|८१}}</noinclude>{{gap}}'''त्रिकंडीमाडू''' स्टेशन टाकलें कीं अगदीं निराळ्या प्रकारचा भूमिभाग लागतो. आतां पांढरी रेताड जमीन लागते व त्यांत भुरटें बारिक काटेरी झुडपांचें तुरळक तुरळक रान लागतें. पुढें जमीनींत घुसलेल्या समुद्राच्या लांब फाट्यावर एक मोठा पूल लागतो. तो टाकल्या बरोबर बेलाचना स्टेशन लागते. येथून पुनः लागवडीचा व केळी नारळी पोफळीचा प्रदेश लागतो; पण जमीन पांढरी व रेताड आहे. हा भाग गोव्यारत्नागिरीच्या समुद्रकांठानजीकच्या वाळवंटी जमीनीसारखा वाटतो. जिकडे तिकडे नारळाची झाडेच झाडे दिसतात. बॅटिकोला जसजसें जवळ येतें तसतशी उत्तम भातशेत जमीन व हिरवीगार भातशेतें लागतात. बॅटिकोला प्रांतांत उत्तम भात व नारळ पिकत असले पाहिजेत हें प्रवाशाच्या तत्काळ ध्यानांत येतें. रात्रीं सात वाजतां आम्हीं बॅटिकोला स्टेशनला पोहोंचलों. रा. बालसिंघमचे मित्र डिस्ट्रिक्ट एंजिनीयर मिस्टर वुइल्यम्स हे स्टेशनवर आले होते. त्यांचे मोटारींत बसून आम्ही बॅटिकोलाच्या उथळ व खाऱ्या पाण्याच्या सरोवराला लागून असलेल्या एंजिनीयरच्या बंगल्यांत आलों.
{{gap}}बॅटिकोला शहराची रचना व उपस्थिति मोठ्या नवलाईची आहे. उथळ खाऱ्या पाण्याच्या सरोवराचे कांठीं शहराचा कांहीं भाग आहे; तर शहराचा सरकारी बंगल्याचा व किल्ल्याचा भाग सरोवरांतील एका छोट्या बेटावर आहे; शहराला व बेटाला जोडणारा एक मोठा पूल आहे. उत्तरेकडून येणारा आगगाडीचा रस्ता व मोटारचा रस्ता हे बेटापलीकडे आहेत. या सरोवराचें समुद्राला मिळणारें मुख बेटापासून तीन मैल दूर आहे. हें सरोवर सुमारें पंचवीस तीस मैल लांब असून त्याचें समुद्रास मिळणारे उत्तरेकडील मुख '''पालमिनमाड''' येथें आहे; तर दक्षिणमुख '''मारुतमुनाई''' या गांवानजीक आहे; या सरोवराची रुंदी मात्र कांहीं ठिकाणीं फारच चिंचोळी असून मधून मधून तें सरोवर रुंदावून त्याचे विलक्षण आकाराचे फाटे जमीनींत घुसले आहेत; समुद्राच्या बाजूस मात्र अरुंद सारख्या रुंदीची तीस मैल लांबीची जमिनीची पट्टी दोन मुखांमध्यें<noinclude></noinclude>
k3nz21joycl9epvd4t3f4p2hugdxokw
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९७
104
111916
236223
2026-08-26T11:37:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236223
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८२ |लंकेच वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>सलग आहे. या अरुंद पट्टींतून लंकेच्या पूर्व किनाऱ्याने थेट दक्षिणेस जाणारा रस्ता गेला आहे. हा सर्व भूमिभाग एका पातळीत असून समुद्रसपाटीपेक्षां पांच फूट सुद्धां उंच नाहीं. यामुळे वरच्या भागांत पुष्कळ व एकदम पाऊस पडल्यास या शहराचा कांहीं भाग जलमय होतो व आसपास जिकडे तिकडे पाणीच पाणी पसरतें. बॅटिकोला शहराची व आसपासच्या भूमिभागाची अशी मोठी मजेदार रचना आहे.
{{gap}}आम्हीं डिस्ट्रिक्ट एंजिनीयरचे बंगल्यांत उतरलो होतों. या बंगल्यासमोरच सुंदर सरोवर असून सरोवराच्या कांठानें सुंदर तांबड्या रेतीचा रस्ता गेला आहे. न्याहारी झाल्याबरोबर रा. बालसिंघम आपल्या मित्रमंडळीस भेटण्यास निघाले. अर्थात् मलाही त्यांनी बरोबर घेतलें. बालसिंघम हे संगतिप्रिय गृहस्थ असून ते बॅटिकोलाहून नुकतेच त्रिंकोमालीस बदलून गेले होते. मुलीला आणण्याकरितां स्वतः बॅटिकोलाला जाण्यांत आपल्या तेथल्या मित्रमंडळीस भेटण्याचा त्यांचा एक उद्देश होता. यामुळें सिलोनमधील निरनिराळ्या जातींच्या सुशिक्षित सुधारलेल्या मंडळीशी माझा सहज परिचय झाला. बडोदा शहरांतील सुशिक्षित अंमलदारांप्रमाणे येथले बहुतेक अंमलदार इंग्लंडांत जाऊन पदवी घेऊन आलेले दिसले. कारण, सिलोनमध्यें विश्वविद्यालय नाहीं. तेथलें एकच कॉलेज पदवीपर्यंत शिकविणारे असून तें लंडन विश्वविद्यालयाला जोडलेलें आहे. यामुळें पुष्कळ लोक विलायतेंत जातात. शिवाय लंडनची पदवी असल्याखेरीज निरनिराळ्या खात्यांतील वरच्या दर्जाच्या अंमलदारांच्या जागा मिळत नसल्यामुळे विलायतेंत जाऊन डाक्तर, एंजिनीयर, बॅरिस्टर व इतर पदव्या घेऊन आलेले पुष्कळ गृहस्थ बॅटिकोला येथें मला भेटले. आम्हीं तेथला सरकारी दवाखाना पाहिला. तेथें पन्नाससाठ रोग्यांची राहावयाची सोय केलेली असून सर्व तऱ्हेच्या शस्त्रक्रिया करण्यांत येतात. शिवाय नवीनच सूतिकागृह बांधण्यांत आलें होतें व त्यांत साहा बाळंत बायांची राहण्याची सोय केली होती. येथें तीन पदवीधर डाक्तर होते. रोग्यांची संख्या भरपूर असते असे दिसलें.<noinclude></noinclude>
ey62k9vxj2zjysmnbyfmpz8np02l0v5
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९८
104
111917
236224
2026-08-26T11:41:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236224
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|८३ }}</noinclude>मग आम्ही बॅटिकोलाचा मुख्य बाजार पाहिला. नंतर बंगल्यावर परत आलों.
{{gap}}दोन प्रहरीं बालसिंघम् यांना व त्यांच्या केंब्रिज सीनीयर लोकल परीक्षेस बसलेल्या मुलीला (हिलाच परीक्षेनंतर परत घेऊन येण्यास रा. बालसिंघम मुद्दाम बॅटिकोलास आले.) एका डॉक्टराकडे पार्टींग फीस्ट देण्यांत आली. त्याकरितां सायंकाळी बरीच स्त्री-पुरुष मंडळी व बालसिंघमच्या मुलीला निरोप देण्यास तिच्या मैत्रिणी जमल्या होत्या. पुरुष मंडळी तर पत्ते खेळण्याकरितां साडेतीन वाजल्यापासूनच जमली. त्यांत नाना जातीचे व नाना धर्माचे लोक होते; एक आय. सी. एस. झालेलेही गृहस्थ होते. सगळी मंडळी मोठ्या मजेनें खेळत होती; खेळ सिंहली सहाजणांनी खेळण्याचा होता; त्यांत दोघे किंवा एकटा एका बाजूनें खेळत व बाकीचे एक होत. हा खेळ कांहींसा ब्रिजसारखा व कांहींसा निराळा आहे. अर्थात् येथें थोडा फार जुगार चालतो; एका पॉइंटला दहा सेंट पैजेचा दर दिसला. मी पैजेचा खेळ खेळत नाहीं व मला खेळ येत नाहीं, या सबबीवर- या दोन्ही सबबी खऱ्या होत्या- मी निष्काम प्रेक्षक राहिलों. याप्रमाणे हे खासगी संमेलन मोठे मजेदार होतें खरें, पण त्यांतली एक पठाडी गोम सांगणं आवश्यक आहे. या सर्व वेळ मंडळी मधून मधून खातपीत होती. मात्र पिण्याचें पाणी शुद्ध साधें नव्हतें, तर तें लाल पाणी होतें, त्या लाल पाण्याचे ग्लासावर ग्लास उडत होते. सारांश, सिलोनच्या सुशिक्षित सुधारलेल्या मंडळींत मद्याचें व्यसन सर्वसामान्य झालें आहे असे मला कळून आलें. आपल्या इकडे ज्याप्रमाणें कोणीही गृहस्थ भेटावयास आला तर त्याला आपण चहा किंवा पान- सुपारी देऊ, त्याप्रमाणें सिलोनमध्यें लाल पाण्याचा ग्लास पुढे करतील. हिंदुस्थानांत सुशिक्षितांच्या पहिल्या पिढीत ज्याप्रमाणें मद्यपानाचें व्यसन सररहा झालें होतें तीच सध्यां सिलोनच्या सुशिक्षितांची स्थिति आहे असें माझ्या अनुभवास आलें. मद्यपानाचें व्यसन येथें सररहा आहे याचे प्रत्यंतर सिलोनमधील सुखासीन खुर्चीच्या रचनेवरूनही कळते.<noinclude></noinclude>
kbyw4vus1qlf9z3aiipqkizadkqs7k4
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/९९
104
111918
236225
2026-08-26T11:45:06Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236225
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८४ |लंकेच वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>सिलोनमध्यें सुखासीन खुर्चीना पाय पसरण्याकरितां हिंदुस्थानच्याप्रमाणे फिरते दोन हात असतात; इतकेंच नाहीं, तर उजव्या हाताखालीं एक छोटा हात असतो; व त्याला काचेचे दोन ग्लास राहतील पण खाली पडणार नाहींत अशा बेताचीं भोके ठेवलेलीं असतात. पण, येथें मद्यपानाचा किती मोठ्या प्रमाणावर प्रचार चालू आहे याचें एक विलक्षण द्योतक मला अनुराद्धपुर येथील सेंट्रल हॉटेल नांवाच्या वसतिगृहाच्या आवारांत मिळालें. या आवारांत बदामी आकाराची छोटीशी बाग आहे. वाटोळ्या रस्त्याच्या बाजूला व बंगल्याच्या जोत्याच्या बाजूला पाम झाडें व फुल झाडें लाविलीं आहेत. ही छोटीशी बांग सुंदर आहे खरी; पण या बागेतील झाडासभोंवार व बदामी आकाराच्या ताटव्या सभोंवार नेहमीं बसवितात तशा अर्धवट तिरकस तांबड्या विटा बसविलेल्या नाहींत! तर दारूच्या एका सांचाच्या बाटल्यांचा विटांचे ऐवजीं उपयोग केला आहे. यावरून या छोट्याशा वसतिगृहांत किती बाटल्या दारू खपत असेल, याची सहज कल्पना होईल. पण हे मयपुराण अप्रस्तुत होत चालले. तरी बॅटिकोला शहराच्या प्रेक्षणीय स्थळांकडे वळू या.
{{gap}}डाक्टराच्या येथें जमलेल्या मंडळींत रा. नटराजन नांवाचे सर्वे खात्यांतील एक तरुण अंमलदार माझ्याप्रमाणेंच मुक्तमद्य नव्हे अपेयमद्य होते. त्यांना तो सिंव्हली पत्त्याचा खेळही येत नव्हता. तेव्हां आम्ही दोघे समानशील जमल्यामुळे शहराचे प्रेक्षणीय भाग पाहून येण्याचें ठरविलें. रा. नटराजन यांच्या मोटारींतून प्रथमतः आम्हीं बॅटिकोला शहराच्या सरोवराच्या मुखाच्या जरा अलीकडे दक्षिण दिशेला जाणाऱ्या मोटाररस्त्यावर असलेला सरोवरावरील पूल पाहण्यास गेलों. हा पूल शहरापासून तीन साडेतीन मैल दूर आहे. रस्त्याच्या दुतर्फा केळी-नारळीच्या बागाचबागा लागतात. यामुळे रस्ता फार सुंदर दिसतो. पूल लोखंडी असून त्याला डोक्यावर लोंबता असा मोठा लोखंडी कठडा आहे. पुलाला साहा कमानी असून प्रत्येक कमान पन्नास फुटांची आहे.<noinclude></noinclude>
lxzooqa1epm7kyrgortdrxu1m6xy3x1
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१००
104
111919
236226
2026-08-26T11:49:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236226
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|८५ }}</noinclude>पूल सुमारें पांच सहाशें फूट लांबीचा आहे. हाच पूल सिलोनमध्ये सर्वांत मोठा पूल होय असे मला समजलें. पुलाचा देखावा प्रेक्षणीय आहे खरा. पुलाचे पलीकडे केळीनारळीच्या दाट बागा आहेत व समुद्राच्या अंगाला पांढऱ्या रेताड जमिनींत हिरवें पण भुरटें झुडपी रान आहे. थोडा वेळ पायीं चालल्यावर आम्हीं तेथून परतलों व मग शहराकडे येऊन बॅटिकोलाचें दीपगृह व बंगालचा उपसागर पहाण्यास गेलों. हे ठिकाणही शहरापासून तीन साडेतीन मैल दूर आहे. रस्ता सरोवराच्या दरेनें जातो. ती दरा दमडी धक्क्याने सबंद बांधून काढली आहे. उजव्या बाजूस त्या धक्क्याची पांढरी कडा, मध्ये काळा डामरी रस्ता व डाव्या बाजूस हिरवीगार पायवाट व पलीकडे नारळीच्या बागा असा हा देखावा मोठा रमणीय आहे. हा भाग फार शांत व निर्मक्षिक वाटतो. येथें डाव्या हाताला एक छोटेसें सरकारी विश्रांतिगृह आहे. उजव्या हातास पांढरा शुभ्र रंग दिलेलें चौकोनी बांधणीचें दीपगृह आहे. त्याच्या प्रत्येक मजल्याला चारी बाजूस एक एक खिडकी राखली आहे. छोटेसें हे दीपगृह सुबक आहे. येथें सरोवर संपते; पण बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यास जाण्याकरितां मध्यें थोडें उथळ पाणी लागतें. तेव्हां उल्डी असलेल्या अगदी अरुंद तोंडाच्या होडींत आम्ही बसलों, होडीवाल्याने लागलीच आम्हांला समुद्राच्या तीराला नेलें. त्या होडीवाल्याचें वल्हें म्हणजे नारळाच्या झाडाच्या पानाच्या देठाचा चार हाताचा तुकडा होता हें पाहून मला मोठें नवल वाटलें. उपसागराचा सर्व किनारा बारिक पांढरट पिवळसर रेतीचा आहे. त्या रेतींत तुरळक रेतीसरशी वाढणारी वेलवजा झुडपे आहेत. या रेतीच्या वाळवंटावरून आम्ही सुमारें अर्धा मैल गेलों. तेथें बंगालच्या उपसागराच्या पाण्याचा रंग हिरवट कबरा दिसत होता. मोठमोठ्या पांढऱ्या फेसानें युक्त अशा लाटा वाळवंटावर येऊन आदळत होत्या. उपसागराचा देखावा भव्य वाटतो. तो अफाट समुद्र पूर्वेकडे किती तरी दूरवर पसरला आहे हें ध्यानांत येऊन आश्चर्यानें मन थक्क होतें! नंतर आम्ही परत फिरून दवाखान्यांत आलों. तरी<noinclude></noinclude>
njdnrimxnbshpzznbootyrdhely0fjc
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०१
104
111920
236227
2026-08-26T11:52:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236227
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८६ |लंकेच वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मंडळीचं खाणेपिणें चालू होतें; आम्ही आल्यावर डॉक्टर साहेबांनी "बालसिंघमच्या कुटुंबांतील सर्व मंडळींच्या संगतिप्रियतेची व सर्वांशी मित्रत्वाच्या नात्यानें वागण्याच्या स्वभावाची येथल्या मंडळीस वारंवार आठवण होते" असें सांगितलें व सर्व मंडळीचा काढलेला फोटो मिस लीला इजला नजर केला. मग सर्व बायकामंडळी घरोघरीं गेली. रा. नटराजननीं रात्रीं मला सरोवरावर होडींतून हिंडावयास व त्या सरोवरांत रात्रीच्या वेळी गाणाऱ्या माशांचें (हा बाटिकोला सरोवराचा एक अलौकिक चमत्कार आहे) गाणे ऐकविण्यास न्यावें असें ठरलें असल्यामुळे ते आपल्या बंगल्यावर जेवावयास गेले व मी एंजिनीयर साहेबांच्या बंगल्याला आलों. मागें पुरुष मंडळी रेंगाळत राहिली. आणखी बऱ्याच रात्रपर्यंत त्यांचा पानविधि चालावयाचा होता. रात्री नऊ वाजतां रा. नटराजन बंगल्यावर आले. आम्हीं एंजिनीयर साहेबांच्या बंगल्या शेजारींच असलेल्या सरकारी पण एंजिनीयरसाहेबांच्या ताब्यांत असलेल्या होडीमध्यें बसलों व सरोवराचे बरेच आंत गेलों. या रात्रीच्या जलसहलेनें मला माझ्या विद्यार्थीदशेतील डेक्कन कॉलेजांतील बोट क्लबाच्या अनुपम अनुभवाची आठवण झाली. मला होडींतून सहल करतांना फार आनंद वाटला. सरोवराच्या पाण्यांत रस्त्याच्या दिव्यांचीं प्रतिबिंबें पडत होतीं. यामुळे दिव्यांची रांग जणू कांहीं द्विगुणित झाल्यासारखी वाटत होती. बॅटिकोला सरोवरांतील गाणारे मासे हा एक या शहराचा अद्वितीय चमत्कार आहे; पण हा चमत्कार चांदण्या रात्रीं उन्हाळ्याच्या दिवसांत व सरोवराचें पाणी अगदीं खारें असतांना ऐकण्यास मिळतो; पण आम्हीं गेलों ती काळोखी रात्र असल्यामुळे व नुकत्याच पडलेल्या पावसानें सरोवराच्या पाण्याचा खारटपणा पुष्कळ कमी झाला असल्यामुळें हें माशांचें गाणें ऐकावयास सांपडावयाचें नाहीं असें रा. नटराजन म्हणाले. तरीपण आम्ही जेथून हें गाणें ऐकावयास सांपडण्याचा संभव होता, अशा सरोवराच्या पलीकडच्या तीरानजीक वल्हवीत गेलों, व तेथें बराच वेळ एकचित्ताने गाण्याचे स्वर ऐकूं येतात<noinclude></noinclude>
fo8tzc87u8pnb04m4tf2zbzo23kdhbb
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०२
104
111921
236228
2026-08-26T11:57:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236228
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||बॅटिकोला व त्रिंकोमाली|८७ }}</noinclude>कीं काय हें पहात बसलों. पण पलीकडच्या तीराच्या भुरट्या रानांतील रानकिड्यांच्या किरकिर या कर्कश आवाजाखेरीज आम्हांला कसलाही गाण्याचा सुस्वर ऐकूं आला नाहीं. तेव्हां आम्ही परतलों. जरी मला माशांचें गाणे ऐकावयास सांपडलें नाहीं तरी कैक वर्षांपूर्वीच्या जलसहलीच्या अनुभवाच्या पुनरुक्तीनें मला आनंद वाटला व मोठ्या प्रमुदित मनानें आम्ही परत होडींतून घरीं आलों. रा. नटराजन यांनी बॅटिकोला शहराची प्रेक्षणीय स्थळें व सरोवर सहलीची मजा दाखविल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानून मी त्यांचा निरोप घेतला. दुसरे प्रातःकाळींच एंजिनीयर साहेबांचे आभार मानून मी बालसिंघम व त्यांची मुलगी यांचे समवेत त्रिंकोमालीस येण्याकरितां आगगाडी गांठली व पूर्वी वर्णन केल्याप्रमाणें १२० मैलांचा अत्यंत सावकाशीचा व मध्येच थांबावे लागत असल्यामुळें अत्यंत कंटाळवाणा वाटणारा प्रवास संपवून परत त्रिंकोमालीस आलों.
{{gap}}त्रिंकोमाली हे शहर पुरातन काळापासून पूर्वेकडील एक सुरक्षित व स्वाभाविक बंदर म्हणून प्रख्यात होतें. म्हणून युरोपियन लोकांच्या व्यापारी स्वाऱ्या पूर्वेकडील देशावर होऊ लागल्यापासून हे बंदर आपल्या ताब्यांत ठेवण्याबद्दल या युरोपियन राष्ट्रांची सारखी धडपड चालू होती. म्हणूनच त्रिंकोमाली येथें युरोपियन राष्ट्रांच्या तीन अंमलाच्या खाणाखुणा अद्याप दृग्गोचर होतात. पहिल्यांदां हे बंदर पोर्तुगीझ लोकांनी हस्तगत केलें व येथील लोकांना ख्रिस्ती केलें. म्हणून या शहरीं पुष्कळ रोमन कॅथॉलिक लोक आहेत. पण पुढें डच लोकांनीं हे बंदर पोर्तुगीझ लोकांकडून हिसकावून घेतलें व आपला अंमल चालू केला. तो बऱ्याच वर्षे चालल्यामुळें डच लोकांचें वर्चस्व व त्यांची वस्ती दाखविणाऱ्या किती तरी गोष्टी त्रिंकोमाली येथें आहेत. आधीं मूळच्या डच लोकांचे वंशज व त्यांच्यापासून तत्रस्थ स्त्रियांना झालेली मिश्र संतती येथें व एकंदर सिलोनमध्यें बरीच आहे. त्यांना '''बर्जर''' म्हणतात. हे लोक चांगले सुशिक्षित असून सरकारदरबारीं यांचें बरेंच<noinclude></noinclude>
1qi7la2sxm6anityok0401z52rbyki7