विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.17 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf 106 74682 236307 236191 2026-08-28T16:00:37Z कल्पनाशक्ती 3813 236307 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=सांगली आणि सांगलीकर |Language=mr |Volume= |Author=अविनाश टिळक |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=सांगली नगरवाचनालय |Address=सांगली |Year=2001 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} ne2o3a6eq54g2eig9zhkn4k9iesjyhe पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०१ 104 77627 236297 202407 2026-08-28T15:01:14Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236297 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude> {{center|{{x-larger|योगभ्रष्ट प्रतिभावान कवी}}}} {{center|{{xx-larger|साधुदास}}}} {{rule}}{{rule|height=4px}}{{rule}} {{gap}}ऐतिहासिक कादंबऱ्यांचं विलक्षण प्रेम असणारा, विशेषतः हरीभाऊंच्या ऐतिहासिक कादंबऱ्यानी भारावलेला एक रसिक एकदा माझ्या एका सांगलीकर मित्रास भेटला. म्हणाला 'अरे, आत्तांच मी तुमच्या सांगलीच्या साधुदासांची "पौर्णिमा" कादंबरी वाचली. काय विलक्षण सुंदर कादंबरी आहे रे? अगदी आमच्या हरीभाऊंच्या तोडीस तोड म्हणेनास. कोण होते हे साधुदास? आणखी कुठल्या कादंबऱ्या आहेत त्यांच्या?"
{{gap}}माझा मित्र बुचकळ्यात पडला. कोण हे साधुदास ?
{{gap}}सामान्य सांगलीकर बुचकळ्यात पडेल तर नवल नाही. पण वाङमयीन अभ्यासकालासुद्धा 'साधुदास' हे नाव तसं माहीत असणं कठीणच.
{{gap}}खरंच कोण होते हे साधुदास ?
{{gap}}साधुदास हे एक अुपजत आणि अद्भुत काव्यप्रतिभा लाभलेले विलक्षण कवी होते. भूतपूर्व सांगली संस्थानचे राजकवी होते. ते प्रथम कवी होते. कादंबरीकार, चरित्रकार वगैरे वगैरे तदनंतर.
{{gap}}अशा या साधुदासांचे मूळ नाव गोपाळ धोंडो पाटणकर. त्यांचा जन्म १७ फेब्रुवारी १८८४ चा. त्यांचे पूर्वज कोकणातून देशावर आले. सांगलीकर पटवर्धन घराण्याची पाटणकर मंडळी हे आप्तजन. त्यामुळे सांगली संस्थानात त्याना इनाम जमिनी मिळाल्या होत्या. खुद्द साधुदासांचे आणखी नशीब म्हणजे ते सांगलीतील घरंदाज, सुखवस्तू गृहस्थ कै. गणेश महादेव मोडक यांचे घरजावई बनले. त्यामुळे त्याना आर्थिक ददात अशी कधी पडली नाही. त्यांचे वडील, धोंडो गोपाळ पाटणकर, ब्रिटिश राज्यात सर्व्हेअर होते. त्यांच्या या मोजणी कामाच्या व्यवसायामुळे त्याना “मोजणीदार-मुजुमदार” असं नाव पडले. तेव्हा साधुदासानी मुजुमदार हेच नाव कायम ठेवलं. असं करायला त्यावेळी आणखी एक तात्कालिक कारण घडलं. त्यांच्या शाळेत 'गोपाळ धोंडो पाटणकर' या नावाचा आणखी एक विद्यार्थी होता.<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर................................७७</noinclude> i3al5dy2zytxn4t7qnd35lxrjnexrwv पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०२ 104 77628 236298 202408 2026-08-28T15:17:36Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236298 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>दोन विद्यार्थी सारख्याच नावांचे. या नामसादृश्यामुळे अनेक वेळा घोटाळे अडत. परीक्षेच्या वेळी दोन्ही नावांची गल्लत व्हायला नको म्हणून साधुदासानी मुजुमदार हे आडनावच कायम ठेवले. चुलत चुलत्याना दत्तक गेल्यानंतर, आणखी एक बदल घडून ‘गोपाळ धोंडो मुजुमदार' या ऐवजी ते 'गोपाळ गोविंद मुजुमदार' झाले.
{{gap}}साधुदासांचे प्राथमिक, दुय्यम शिक्षण सांगलीतच झाले. सांगली हायस्कूलचे विद्यार्थी. तिथं श्रीपादशास्त्री देवधर हे प्रख्यात शिक्षक संस्कृत शिकवत. मॅट्रिकच्या परीक्षेत आपल्या विद्यार्थ्याना, जगन्नाथ शंकरशेट ही संस्कृत विषयाची शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी, त्यांची सतत धडपड असे. विद्यार्थ्यांकडून कसून तयारी करुन घेऊन असे अनेक विद्यार्थी ही प्रतिष्ठेची शिष्यवृत्ती मिळवून गेले होते. साधुदास हे देवधरशास्त्रींच्या आवडत्या अशा विद्यार्थ्यांपैकी होते. शास्त्रीजीनी विशेष परिश्रम घेऊन, त्यावेळच्या इंग्रजी ५ वीच्या वर्गात असतानाच, साधुदासांकडून कालिदास, माघ इत्यादी प्रमुख कवींचे काव्यग्रंथ अभ्यासून घेतले होते. साधुदासांचा इतर विषयांचा अभ्यासहि चांगला असे. गणित हा तसा नावडता विषय असूनहि त्यांचा वर्गात नेहमी पहिला नंबर असे. घरी रोज संध्याकाळी, त्यांच्या मातोश्री, भक्तिविजय, पांडव - प्रताप आदी ग्रंथ वाचून घेत. त्यामुळे संतवाङमयाची पारायणे अनायासे बालपणातच घडली.
{{gap}}आपल्यामध्ये काव्यगुण आहेत, याचा त्याना स्वतःला शोध, बालपणातच लागला होता. मिस्किल, थट्टेखोर स्वभाव, आणि सहजपणे शब्द कवितेत पेरता येतात याची त्याना स्वतःला झालेली जाणीव, यामुळे ते येता जाता कवने करु लागले. त्यांच्या घरी जहांगीळमामा अशा विचित्र नावाचे एक भटजी येत असत. पुख्खा झोडण्यासाठी सदैव अत्सुक असलेल्या त्यांच्या बुभुक्षित वृत्तीची चेष्टा करताना वयाच्या ११व्या वर्षी त्यानी “ गरूड जसा गगनातुनि झेपावे अमृताचिया कुंभा, तैसा मामा धावे ऐकुनि झोडावयासि अदकुंभा” अशी आर्या रचली. एका तिरळ्या डोळ्याच्या नारबा नावाच्या माणसावर "नाऱ्या --- तू तिरवा, परंतु बरवा” अशा प्रकारच्या कविता रचत असत. यात थोडा चहाटळपणाचा भाग असला, तरी पुढे प्रसिद्ध पावलेल्या त्यांच्या शीघ्रकवित्वाची पेरणी, अशा कवितांमधूनच झाली असावी.
{{gap}}मात्र साधुदासांना त्यांचे हे काव्यप्रेम, मॅट्रिकच्या परीक्षेच्या वेळी, चांगलेच भोवले. देवधरशास्त्रीनी शंकरशेठ शिष्यवृत्तीसाठी त्यांची चांगली तयारी करुन घेतली होती. ऐन परीक्षेच्या वेळी, इंग्रजीचे संस्कृत भाषांतर करण्याच्या प्रश्नाच्या वेळी, सरळ भाषांतर करायचे सोडून, साधुदास प्रहर्षिणी वृत्तामध्ये करत बसले. त्यामुळे त्यातच वेळ खर्ची पडून शिष्यवृत्ती हुकणार होती हे सांगायला कुणा ज्योतिषाची<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..................................७८</noinclude> 0og05vwqk24pygjny3ykwdb9d844as8 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०३ 104 77629 236299 202410 2026-08-28T15:19:27Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236299 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>गरज नव्हती.
{{gap}}मॅट्रिकनंतर पुढील शिक्षणासाठी साधुदासानी पुण्याला प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजात प्रवेश घेतला. पण काय बिनसले कुणास ठाऊक? पहिल्या टर्मनंतर ते सांगलीला परतले ते कॉलेजला रामराम ठोकूनच !
{{gap}}ही घटना १९०३ सालची. म्हणजे त्यावेळी ते जेमतेम १९-२० वर्षाचे होते. पुढच्याच वर्षी ते त्यांच्या दुधगावच्या चुलत चुलत्यास दत्तक गेले. पण दुधगावला त्यानी कधी फारसे वास्तव्य केले नाही.
{{gap}}काही काळ नोकरी करावी, अशा हेतूने त्यानी सांगली संस्थानात, बेलिफाची नोकरी पत्करली. बेलिफाचे काम म्हणजे जप्त्या आणि वसुली. त्यात त्यांचे मन रमेना. एका प्रसंगात त्याना कुणीतरी लाच द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे वैतागून त्यानी नोकरीच सोडली.
{{gap}}यानंतरची दहा-बारा वर्षे त्यांनी संपूर्णपणे स्वस्थतेत घालवली. कोणतीह नोकरी धंदा न करता! घरची स्थिती चांगली असल्यानेच त्याना असा स्वस्थतेत काळ घालवणे शक्य झाले. या काळात त्यानी बराच वेळ बुद्धिबळे खेळण्यात घालवला. या खेळाचं त्याना अतोनात वेड लागलं. त्यापायीच त्यानी कॉलेजशिक्षणाकडं दुर्लक्ष केलं असं म्हणतात!
{{gap}}या स्वस्थतेच्या काळात, सांगलीतील दोन मातब्बर व्यक्तींबरोबर त्यांचा संबंध आला. पहिले म्हणजे राजवैद्य आबासाहेब सांबारे. आबासाहेबांचं घर म्हणजे त्या काळातील सांगलीतील एक संस्थाच होती. वैद्य म्हणून त्यांची कीर्ती दिगंत होतीच पण त्याबरोबर संगीतात त्याना मोठी रुची होती, जाणकारी होती. बाळकृष्णबुवा, रहिमतखाँ, अल्लादियाखाँ अशा मोठमोठ्या गवयांचे त्यांच्याकडं गाणं होई. साधुदासांच्या शब्दात म्हणजे असं गाणं त्यानी ‘अमाप' ऐकलं. त्यामुळे त्यांचा स्वत:चा संगीताचा व्यासंग वाढला. संगीताच्या परिश्रमपूर्वक केलेल्या अभ्यासामुळेच, त्याना बाळकृष्णबुवा आणि रहिमतखाँ यांचेवरील मृत्युलेख लिहिताना, त्यांच्या गायनशैलीसंबंधी अधिकारवाणीने लिहिता आले.
{{gap}}दुसरी महनीय विभूती म्हणजे सांगलीतील परोपकारी संत कै. हणमंतराव तथा तात्यासाहेब कोटणीस. ते स्वतः वकिलीचा व्यवसाय करता करता बाकीचा वेळ हरी-कीर्तनात घालवीत. ते स्वत: संतवाङ्मयाचे अभ्यासू होते. साधुदास त्यांच्या सान्निध्यात आल्यावर एवढे भारून गेले की त्यानी त्यांच्या संप्रदायाचा अनुग्रह घेतला. कोटणीस महाराजांबरोबर अनेकदा कीर्तनप्रसंगी साथ करण्यासाठी ते अभे राहात आणि संतांची पदे म्हणता म्हणता स्वरचित पदेही म्हणत. या साधुपुरुषामुळे<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर..............................७९</noinclude> d94y20fbi7j56ylocaed8nlhrnv7gmg पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०४ 104 77630 236300 202411 2026-08-28T15:23:24Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236300 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>ते एवढे प्रभावित झाले होते की त्यांच्या मृत्युनंतर, त्याना त्यांचे चरित्र लिहिल्याशिवाय राहवेना. त्यामुळेच एक अप्रतिम, रसाळ चरित्र लिहिले गेले.
{{gap}}१९०३-४ पर्यंत साधुदासांचा अभ्यास प्रामुख्याने संस्कृत वाङमयाचा होता. कोटणीस महाराजांमुळे त्यांच्या हातात ज्ञानेश्वरी आली. या दहा-बारा वर्षांच्या स्वस्थतेच्या काळात त्यानी भरपूर वाचन केले. चिंतन केले. संतकाव्याचा फार बारकाईने अभ्यास केला. नित्यनेम म्हणून ४० वर्षे त्यानी ज्ञानेश्वरीचे वाचन केले. या काळातील अभ्यासामुळे त्यांचे भाषाप्रभुत्व स्वयंसिद्ध झालेले होते.
{{gap}}१९१५ साली सांगली हायस्कूलमध्ये एका मराठी भाषा शिक्षकाची जागा रिकामी झाली. सांगलीच्या राजेसाहेबांच्या अिच्छेमुळे साधुदासानी ही जागा पत्करली. ही नोकरी त्यानी १६ वर्षे केली. १९३१ ते १९४० या काळात त्यानी संस्थानातील स्टेट प्रेसचे सुपरिटेंडंट म्हणून काम केले.
{{gap}}६ एप्रिल १९४८ रोजी सांगलीतच कॅन्सरच्या दुखण्यात त्यांचे निधन झाले.
{{gap}}शिक्षक म्हणून साधुदासांचा स्वतःचा काळ फार आनंदात गेला. मात्र विद्यार्थ्याना परीक्षेच्या दृष्टीने त्यांचे अध्यापन जरा कठिणच होते. कारण त्यांची एकूण वृत्ती शिक्षणशास्त्राच्या तंत्रात बसणारी नव्हती. नेमक्या वेळेला अभ्यासाचा तास सुरु करुन, नेमक्या वेळेत संपवणे, हा खाक्या त्याना जमण्यासारखा नव्हता. आजच्या जमान्यात तर परवडलेच नसते. पण संस्थानी काळ होता. राजेसाहेबांची मर्जी होती म्हणून निभावले. मात्र एरवी त्यांचा तास म्हणजे काव्यशास्त्रविनोदाची मोठी पखरण होती. मूळ विषयाच्या अनुषंगाने, अनेक चपखल अदाहरणे, आख्यायिका, यांची धमाल असे. त्यांच्या स्वतःच्या विनोदी वृत्तीमुळे त्यांचे तास रंजक होत. विद्यार्थ्याना ते बहुश्रुत करुन सोडत. स्नेहसंमेलन वा अन्य समारंभ प्रसंगी सुंदर पदे रचून विद्यार्थ्यांकडून ते परिश्रमपूर्वक स्वतः बसवून घेत. नाटकाच्या तालमी घेत; जागेची अडचण असे तेव्हा स्वतःच्या घरी तालमी घेत. त्यामुळे विद्यार्थीवर्गात ते अत्यंत लोकप्रिय होते. कधी कधी त्यांच्या तासाची वेळ झालेली असे आणि साधुदास गाढ निद्रेच्या आधीन झालेले असत. अशा वेळी त्याना अठवून आणावे लागे. पण एकदा का शिकवायला सुरुवात केली की मग ते पूर्णपणे त्यामध्ये रंगून जात. इंग्रजी कविता शिकवताना, कधी संस्कृत श्लोकांत त्यांचे भाषांतर करुन दाखवत तर कधी तुकारामाचा अभंग शिकवताना, त्या अभंगासारखेच पाच सहा अभंग, तत्क्षणी करुन दाखवत. विध्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांची अपजत काव्यप्रतिभा बहरून येई; दुथडी भरून वाहू लागे.{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर...................................८०</noinclude> pe18y5qrwar5k4zortg0g4o80vlwft6 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०५ 104 77631 236301 202413 2026-08-28T15:26:58Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236301 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}साधुदासांच्या कादंबऱ्या १९३१ नंतर प्रकाशित झाल्या. (गद्यलेखन ते गो.गो. मुजुमदार या नावाने करत.) त्यानी गद्य लेखन पुष्कळ केले, चांगले केले. पण त्यांची खरी प्रतिभा जन्मजात कवीची होती. संस्कृत वाङमयाच्या अभ्यासामुळे, त्याना कालिदासाच्या रघुवंशाचे मोठे आकर्षण होते. त्या प्रेमापोटीच त्यानी रघुवंशावर आधारित अशी महाकाव्य रचना केली. वनविहार, रणविहार व गृहविहार अशा तीन विभागात ही रचना आहे. या महाकाव्यात त्यानी ४० हून अधिक अशा निरनिराळ्या वृत्तांचा अपयोग केला आहे. छंदशास्त्रावरील त्यांच्या विलक्षण प्रभुत्वाने इतिहासाचार्य राजवाडेसुध्दा प्रभावित झाले होते.
{{gap}}पूजेला बसल्यावर एक तरी कविता वा श्लोक देवाला अर्पण करण्याचा. कित्येक वर्षे त्यांचा परिपाठ होता. पूजा झाली की इतर फुलांसारखे त्या कवितांचेपण निर्माल्य होई. त्यातून बचावलेल्या कवितांचा पुढे संग्रह निघाला. तोच पुढे 'निर्माल्य संग्रह' (भाग - १,२) म्हणून प्रसिध्द झाला. त्यानी पंडिती थाटाची रचना केली; तरीसुध्दा त्याना लोकगीते, पोवाडे, भोंडल्याची गाणी, झिम्म्याची गाणी, भारुडे, फुगडीचे अखाणे, आरत्या, अशा प्रकारांविषयी आस्था होती. त्यानी अशा प्रकारांचे संकलन करुन ती 'मराठी गाणी' म्हणून प्रकाशित केली.
{{gap}}'शीघ्रकवित्व' हा साधुदासांच्या प्रतिभेचा विलोभनीय विशेष होता. वर्गात शिकवताना बघता बघता ते तुकारामासारखे अभंग रचत किंवा मोरोपंतासारख्या आर्या तोंडी सांगत. सांगली संस्थानासाठी एक 'संस्थानगीत', राजेसाहेबाना हवे होते: तेव्हा बँडच्या अवघड सुरावटीवर म्हणता येतील, अशी दहा गीते अवघ्या तासाभरात त्यानी लिहिली. त्यातलेच एक गीत राजेसाहेबानी पसंत केले. “हेरंबा अतिसदया, रक्षी पार्वति - तनया, 'पटवर्धन' वरद सुता, नृपतिस सांगलीच्या या" हे गीत जुन्या सांगलीकर मंडळीना सुपरिचित आहे. एकदा साधुदासांचे एक कविमित्र सुमंत, त्यांच्या घरी आले होते. मुक्काम संपल्यावर ते निघाले. स्टेशनवर त्याना पोचवण्यासाठी साधुदास गेले. गाडीला पंधरा-वीस मिनिटे बाकी होती. दोघा कवीनी ठरविले की परस्परांचा निरोप आपण काव्यात घेऊ. सुमंत कवीनी पंधरा मिनिटे घेतली तर साधुदासानी अवघी पाच ! दोघांच्याहि कविता अद्धृत करण्यासारख्या आहेत; पण विस्तारभयास्तव देता येत नाहीत. सुरुवातीच्या ओळी अशा होत्या.
{{block center|<poem>सुमंत : “निरोप मजला दे रे मित्रा! दे निज गावा जाया । {{gap}}{{gap}}समान हृदये मिळून गेली, भिन्न जरी काया ॥"</poem>}} {{center|...........................}} {{Block center|<poem>साधुदास : "आला आधी अपरिचितापरी त्यासि ठाव दिधला । {{gap}}{{gap}}अपरिचिताचा परिचित होऊनि बद्धमूल झाला ||</poem>}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.................................८१</noinclude> fl6pg1jajt0rljuux2eipj4pvh45xal पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०६ 104 77632 236302 202414 2026-08-28T15:28:55Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236302 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|.............................}} {{center|<poem>मनामनाचा मेळ जाहला नभाहुनी थोर । निरोप घेऊनि आता मित्रा कोठे जाणार?"</poem>}} {{gap}}त्यांच्या एका सत्कार समारंभात, त्यांच्या विद्यार्थ्यांनी आग्रह केला म्हणून त्यानी निरनिराळ्या वृत्तांमध्ये आभार मानले.
{{gap}}एकदा तर त्यांच्या शीघ्रकवित्वाची कसोटीच लागली; आणि ती सुद्धा एका मातब्बर अशा कवीपुढे! त्याचं असं झालं :
{{gap}}एकदा सुप्रसिद्ध कवि रेंदाळकर सांगलीला आले होते. त्याना साधुदासांचे शीघ्रकवित्व हे काहीतरी गौडबंगाल असावे असे वाटे. पहाटे अुठल्यावर त्यानी पेन आणि कागद साधुदासांसमोर धरले; आणि आत्ताच्या आत्ता कविता लिहा म्हणून, सांगितले. अशी परीक्षा होईल याची साधुदासाना तिळमात्र कल्पना नव्हती. तरीपण न गडबडता, त्यानी कोणत्या विषयावर कविता लिहू असे विचारले, तेव्हा रेंदाळकर म्हणाले, “वाटेल त्या विषयावर लिहा.” साधुदास म्हणाले, "आता ते चालणार नाही, विषय तुम्हीच द्या. नाहीतर म्हणाल की कविता पूर्वीच करुन ठेवली होती" रेंदाळकर म्हणाले, “मग मी कविता मागत आहे याच विषयावर लिहा."
{{gap}}लागलीच चोवीस ओळींची कविता सरसर लिहून साधुदासानी रेंदाळकरांच्या पुढ्यात ठेवली. तेव्हा ते चाट पडले. पुढे ही हकीकत त्यानी सुप्रसिद्ध कादंबरीकार, हरीभाऊ आपटे, याना सांगितल्यावर त्याना पण आश्चर्य वाटले. ताबडतोब त्यानी ती कविता आपल्या 'करमणूक' मध्ये प्रसिध्द केली.
{{gap}}त्या गाजलेल्या कवितेचे काही चरण असे होते.
{{block center|<poem>"कविने कविता मज मागितली, करण्या बसल्या समयी कथिली । कविता मज पाहुनिया रुसली, तरि आज करु कविता कसली ॥ कविता स्वर का विण्यामधले, म्हणूनी तुज छेडुनि दावू भले । कविता गुज बोल मनापुरता, प्रिय तू बन, मी करितो कविता ॥"</poem>}} {{gap}}इतके शीघ्रकवित्व अंगी असूनहि, खुद्द साधुदासाना त्याचे काही विशेष वाटत नसे. ते म्हणत की हे सारे सरावाचे काम आहे. काव्याचा मुख्य गाभा म्हणजे रसपरिपोष वृत्ताच्या साच्यात घालण्याचे काम फारसे महत्त्वाचे नाही.
{{gap}}साधुदासानी सहज म्हणून अनेक काव्ये रचली. एखादा विशेष समारंभ, दरबारातील प्रसंग, दसऱ्याचे सोने, तिळगूळ समारंभापासून अगदी नामकरण समारंभापर्यंत, अनेक निमित्ताने त्यानी कविता लिहिल्या. श्वास घ्यावा अितक्या सहजतेने ते कविता<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.................................८२</noinclude> jt0y658htduf0b0rdnsnjuzrnrscui2 पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०७ 104 77633 236303 202417 2026-08-28T15:31:56Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236303 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>लिहित. स्वागतपर पद्यांकडं कुणी फारसं गांभीर्यानं पाहात नाही. पण सांगलीत जो नाट्यमहोत्सव झाला, त्यावेळचं श्रुतिमनोहर व अर्थवाहक स्वागतपर पद्य ऐकून, प्रा. श्री. म. माटे यानी आवर्जून कवीची चौकशी केली.
{{gap}}ते कवि साधुदास होते हे सांगायला नकोच.
{{gap}}दुर्दैवाने त्यांच्या अशा कविता, किंवा निरनिराळ्या मासिकांमधून प्रसिद्ध होणाऱ्या कवितांची, गणतीच कोणी ठेवली नाही. साधुदासांसारख्या प्रसिद्धी-पराङमुख कवीला तर अशा अगणित कवितांची मोजदादच नव्हती. सुप्रसिद्ध कवि रे. ना वा. टिळकानी एका कवितेत बहरलेल्या वेलीचे वर्णन करताना म्हटलयं की “किती आपुली, फुले अुमलली, कुठे लटकली । पर्वा न तयाची वेलीला, सुंदरतेची ही लीला ॥"
{{gap}}साधुदासांच्या काव्यरचनेला हे वर्णन तंतोतंत लागू पडते. त्यांची प्रतिभा बंद कुलुपात ठेवलेल्या कृपणाच्या संपत्तीसारखी नव्हती तर खूष होताच हातातील कडं भिरकवणाऱ्या खानदानी श्रीमंताच्या संपत्तीसारखी होती. कुणा संशोधकाने त्यांची अशी विखुरलेली काव्यरले एकत्र करुन पुस्तक काढलं, तर काव्यरसिक नक्कीच त्याला मनापासून दुवा देतील.
{{gap}}कवी यशवंत तर त्याना गुरुस्थानीच मानत असत. काव्यशास्त्राचे पहिले- वहिले धडे त्यानी साधुदासांच्या हाताखालीच गिरवले.
{{gap}}ऐतिहासिक कादंबरीलेखनाला, त्यानी आयुष्याच्या अुत्तरार्धात सुरुवात केली. त्याचे थोडे-फार श्रेय सांगलीच्या राजेसाहेबांकडे जाते. तो गुणग्राहक राजा, साधुदासांच्या वाङमयनिर्मितीकडे, कौतुकाने पहाणारा रसिक होता. साधुदासांची इतिहासाची आवड आणि त्यांची चटकदार कथनशैली, राजेसाहेबाना परिचित होती. "आपण पूर्वजांच्या ऐतिहासिक गोष्टी लोकांपुढे अुत्तम तऱ्हेने ठेवू शकाल” असे श्रीमंत म्हणाले. त्यामुळेच ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिण्याची स्फूर्ती झाली असे साधुदास कृतज्ञतापूर्वक म्हणत असत.
{{gap}}ऐतिहासिक कादंबऱ्या जरी साधुदासानी अुशीरा लिहिल्या असल्या तरी इतिहास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अभ्यासाचा विषय होता. कै. वासुदेवशास्त्री खरे, राजवाडे, पारसनीस प्रभृतींनी जी ऐतिहासिक साधने प्रसिद्ध केली होती त्याचा त्यानी कसून अभ्यास केला होता. सांगली संस्थानातील नोकरीमुळे, संपूर्ण पटवर्धन दप्तर, त्याना अभ्यासता आले. पण हा झाला अभ्यासाचा भाग. त्याना स्वतःला पेशवाई हा अत्यंत प्रेमाचा भाग वाटत असे. ते स्वतः प्रखर स्वदेशाभिमानी असल्याने<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर................................८३</noinclude> 3yv01g9dsvmvb9r2dpy6szn2ucsu08u पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०८ 104 77634 236304 202427 2026-08-28T15:49:24Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236304 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>“एकेकाळी सर्व हिंदुस्थानभर पसरलेले आमचे साम्राज्य आम्ही कोणत्या चुका करुन घालवले आणि स्वराज्यप्राप्तीकरता चाललेल्या सांप्रतच्या झगड्यात, आणि पुढे मिळणाऱ्या स्वराज्यात, पूर्वी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न व्हावी” अशा मुख्य हेतूने त्यांनी ऐतिहासिक कादंबरीलेखन केले. तसे त्यानी पहिल्या कादंबरीच्या प्रस्तावनेतच नमूद केले आहे. महाराष्ट्राच्या साम्राज्याचा आणि पर्यायाने हिंदुस्थानचा १७६७ पासून १८१८ पर्यंतचा म्हणजे श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या कालापासून ते पेशवाईचा अस्त होईपर्यंतच्या काळाचा इतिहास त्याना कादंबरीच्या माध्यमातून एकूण १६ भागात सांगायचा होता. दुर्दैवाने त्यापैकी तीनच कादंबऱ्या पूर्ण होऊ शकल्या. पहिल्या 'पौर्णिमा' या कादंबरीत, श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या काळातील, मराठ्यांच्या ऐन अुत्कर्षाचे कथानक आहे. 'मराठेशाहीचा वद्यपक्ष प्रतिपदा' या कादंबरीत, हैदरअलीला पेशव्यानी नेस्तनाबूत केले त्याची हकीकत आहे; तर 'द्वितीया' या तिसऱ्या कादंबरीत श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या दहा महिन्यांच्या दुर्दैवी कारकीर्दीचे चित्रण आहे. ऐतिहासिक सत्याचे अचूक भान, चित्तवेधक लेखनशैली, अत्तम स्वभावचित्रणे, प्रत्ययकारी वर्णने, यामुळे या कादंबऱ्या अत्यंत वाचनीय झाल्या आहेत. जुन्या चालीरीती, वस्त्रभूषणे, तत्कालीन खेळ करमणुकी, जुने वाक्प्रचार या सर्वांची साधुदासाना अत्तम माहिती असल्याने, कादंबरीतील प्रसंगात वाचक गुंगून जातो. नुसत्या दागिन्यांच्या आणि जेवणावळींच्या वर्णनाने दिङ्मूढ होतो. सोन्याचे दागिने इतक्या विविध प्रकारचे असतात हेच आधी कुणाला माहीत नसते! साधुदास दागिन्यांची माहिती करुन घेण्यासाठी एका म्हाताऱ्या सोनाराकडे हेलपाटे घालत. हत्तीच्या अंगावरील साजाची माहिती करून घेण्यासाठी, माहुताशी मैत्री जोडत. तासन तास निरीक्षण करीत. अशा प्रयत्नांमुळे कादंबरीतील वर्णने हुबेहुब वठत. साधुदासानी कादंबऱ्यातून रेखाटलेले, शनिवारवाड्याचे वर्णन अस्सल आहे, असे शिफारसपत्र अनेक तज्ञांनी दिलेले आहे.
{{gap}}अेवढ्या ताकदीची कादंबरीमाला पूर्ण न व्हावी हे रसिकांचेच दुर्दैव होय. एरवी हरिभाऊ, नाथमाधव यांच्या बरोबरीने साधुदासांचे नाव ऐतिहासिक कादंबरीच्या बाबतीत घेतले गेले असते.
{{gap}}काव्य आणि कादंबरी याखेरीज साधुदासानी आणखीही गद्य लेखन केलं आहे. 'राजसेवा' या नावाचं एक नाटक त्यानी लिहिलं होतं. पण पहिल्याच प्रयोगात, एका तत्कालीन बदफैली राजाशी साम्य आढळल्यामुळं, प्रेक्षकांमध्ये हुल्लड माजली आणि पहिलाच प्रयोग अखेरचा ठरला!
{{gap}}आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या तात्यासाहेब कोटणीसमहाराजांचे अत्यंत रसाळ<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर............................८४</noinclude> evwoncwt5c1blv28xqu32spj6n4aj1u पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०९ 104 77635 236305 202428 2026-08-28T15:56:42Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236305 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>चरित्र साधुदासानी लिहिले आहे. 'मराठी भाषेची सजावट' हा त्यांचा मराठी व्याकरण आणि साहित्य याविषयी चपखल अदाहरणे देऊन सिद्ध केलेला अभ्यासपूर्ण ग्रंथ अितका आदर्श ठरला की मुंबई आणि नागपूर या दोन्ही विद्यापीठानी टेक्स्ट बुक म्हणून या पुस्तकाचे दोन्ही भाग लावले होते.
{{gap}}साहित्यसेवेखेरीज साधुदासांच्या व्यक्तिमत्वात अनेक विलोभनीय पैलू होते. नुसतेच शिक्षक, कवि, कादंबरीकार नव्हते तर बैठ्या खेळांचे जाणकार खेळाडू होते. तबलापटू होते. रसिक संभाषणकार होते. त्यांच्या हास्य-विनोदानी गाजवलेल्या बैठकांची वर्णने आजहि जुने सांगलीकर चवीने करताना आढळतात. गंजिफा, फासे, पत्ते ते खेळतच; पण बुद्धिबळाचे ते नामवंत खेळाडू होते. एकाच वेळी आठ आठ खेळाडूंबरोबर ते खेळत आणि हमखास जिंकत. अनेक मोठ्या स्पर्धा त्यानी जिंकल्या होत्या. स्टेट प्रिंटिंग प्रेसमध्ये नोकरीत असताना, ते बुद्धिबळाची इंग्रजी पुस्तके मागवून, त्यातील गाजलेल्या डावांचा बारकाईने अभ्यास करत. म्हणूनच त्यानी अधिकारवाणीने 'बुद्धिबळाचा मार्गदर्शक' असे एक छोटेखानी पुस्तक लिहिले. संगीततज्ञ प्रा. ग. ह. रानडे यांच्या 'संगीताचे आत्मचरित्र' या पुस्तकाला, त्यानी लिहिलेल्या मार्मिक प्रस्तावनेवरून, त्यांची संगीताची जाणकारी दिसून येते. स्वतः तबलापटू असल्याने, ताल आणि शीघ्रकवित्व यावरील त्यांचे विलक्षण प्रभुत्व दर्शविणारी एक सत्यकथा फार बोलकी आहे. साधुदास, कोटणीसमहाराजांच्या कीर्तनात, गाण्याची साथ करण्यास अभे रहात याचा अल्लेख वर आला आहेच. शिवरामबुवा गुरव नावाचे तबलजी साथीला बसत. ते वाजवणारे चांगले होते, पण साथीचे तारतम्य ओळखत नसत. मुख्य गाण्याला बाधा न आणणे ही गोष्ट महत्त्वाची. पण साथीच्या वेळी बोल-परणानी आणि तऱ्हेतऱ्हेच्या करामतीनी, कोटणीसमहाराजांना अनेकदा त्रास होई, “बुवा, साधा ठेका लावा" असे वारंवार सल्ले दिलेले असतानाह ऐन वेळी त्यांची गाडी घसरत असे. साधुदास स्वतः तबल्याचे अुस्ताद. तेव्हा या शिवरामबुवाना थोडीशी 'चुणुक' दाखवावी, म्हणून एकदा कीर्तन चालू असतानाच, त्यानी 'सवारी' तालामध्ये, पंधरा मात्रांचे एक भजन तिथल्या तिथं रचून कोटणीसमहाराजांच्या परवानगीने स्वतःच म्हणायला सुरुवात केली. भजनाचा ताल काही केल्या शिवरामबुवांच्या ध्यानी येईना. ते बुचकळ्यात पडले. शेवटी ठेका लावता येईना म्हणून तबल्यावर हात ठेवून स्वस्थ बसले! मनोमन वरमले. गाणाऱ्यांची नेहमी करत तशी त्यांचीच कोंडी झाली. अर्थात् साधुदासानी नंतर ताल समजावून सांगितल्यावर, बुवानी ठेका लावला. गाण्याला मजा आली तो भाग वेगळा.
{{gap}}ते उत्स्फूर्त रचलेले पद असे होते;{{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर................................८५</noinclude> 63kz2atz9x5df505k4qoj3bnak7c4am पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११० 104 77636 236306 202429 2026-08-28T15:58:43Z कल्पनाशक्ती 3813 /* प्रमाणित */ 236306 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}"श्रीराम, जयराम, जयजयराम, सीताराम, राजाराम, मुनि - जनमानस - हंस परात्पर ॥ धृ ॥ ही भवगंगा, कीर्तनगंगा, नवरस - गंगा, निववी अंगा ॥ १ ॥ ही रसधारा, परमोदारा, सौख्यागारा, कलिसि अतारा ॥ २ ॥ ही जप-माला, हरिल भवाला, 'साधुदास' कवि देई हवाला ॥ ३ ॥ "
{{gap}}सांगलीकर राजेसाहेबानी सोन्याचे कडे आणि 'राजकवि' हा किताब देऊन साधुदासाना गौरवलं होतंच, शिवाय तहहयात पेन्शनही दिली होती. कराड येथे भरलेल्या 'दक्षिण महाराष्ट्र साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते तर सांगली येथे भरलेल्या सत्ताविसाव्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते. असे थोडे मानमराबत त्याना मिळाले, तरी त्यांच्या अंगभूत प्रसिद्धीपराङमुखतेमुळे, आणि त्याकाळात पुण्या-मुंबईपासून दूर आडगावी असलेल्या सांगलीत राहण्याने, त्यांचा अदोअदो कमी म्हणजे फारच कमी झाला ही वस्तुस्थिती आहे.
{{gap}}ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड साहित्यिक प्रिन्सिपल गोकाक यांचे काही काळ विलिंग्डन कॉलेजचे प्राचार्य म्हणून सांगलीत वास्तव्य होते. त्याना साधुदासांच्या गुणांची जाणीव होती. त्यानी एके ठिकाणी म्हटलय् की No citizen of Sangli can afford, not to know Sadhudas. If he can, he has missed one of the pleasures of life.
{{gap}}प्रत्येक वाङमयप्रेमी सांगलीकराने हे आवर्जून लक्षात ठेवायला हवं! नाहीतर प्रारंभी अद्धृत केलेल्या प्रसंगातील, सांगलीकरासारखी त्याची अवस्था व्हायची!
{{center|●●●}} {{nop}}<noinclude>{{rule}} सांगली आणि सांगलीकर.............................८६</noinclude> 8gtw4gj3yqq88w2gd38c2y1a9jdgcsy अनुक्रमणिका:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf 106 104089 236309 236252 2026-08-29T09:08:00Z कल्पनाशक्ती 3813 236309 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=लंकेचें वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1934 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो" 62="कँडी व पेरेडॅनिया" 66="फोटो" 73="फोटो" 79 ="खडक-देऊळ व खडक-किल्ला" 82="फोटो" 87="फोटो" 92 ="बॅटिकोला व त्रिंकोमाली" 104 ="फोटो" 107 ="फोटो" 112 ="लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत" 114 ="फोटो" 117 ="फोटो" 133 ="फोटो" 136 ="जाफना अथवा नागद्वीप"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] ebp5f8dyo7fwri2p39xea6p9hf2dase 236330 236309 2026-08-29T10:54:12Z कल्पनाशक्ती 3813 236330 proofread-index text/x-wiki {{:MediaWiki:Proofreadpage_index_template |Type=book |Title=लंकेचें वर्णन व वृतांत |Language=mr |Volume= |Author=गोविंद चिमणाजी भाटे |Translator= |Editor= |Illustrator= |School= |Publisher=गोविंद चिमणाजी भाटे |Address=कुलाबा |Year=1934 |Key= |ISBN= |OCLC= |LCCN= |BNF_ARK= |ARC= |Source=pdf |Image=1 |Progress=C |Pages=<pagelist 5="प्रस्तावना" 7 ="अनुक्रमणिका" 8="नकाशा" 9 ="लंकापुराणपरिचय" 21 ="लंकेचा दंतकथात्मक इतिहास" 37 ="लंकेंत पहिले पाऊल : कोलंबो बंदर व रत्नपुर नगर" 43="फोटो" 52 ="फोटो" 59="फोटो" 62="कँडी व पेरेडॅनिया" 66="फोटो" 73="फोटो" 79 ="खडक-देऊळ व खडक-किल्ला" 82="फोटो" 87="फोटो" 92 ="बॅटिकोला व त्रिंकोमाली" 104 ="फोटो" 107 ="फोटो" 112 ="लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत" 114 ="फोटो" 117 ="फोटो" 133 ="फोटो" 136 ="जाफना अथवा नागद्वीप" 150 ="श्रीपाद शिखर"/> |Volumes= |Remarks= |Width= |Css= |Header= |Footer= }} [[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]] 31lw17qs8lpkn4dp6ccxmy8quqe1txg सदस्य चर्चा:Deepak dukale 3 111964 236296 2026-08-28T14:41:28Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 236296 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Deepak dukale}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) २०:११, २८ ऑगस्ट २०२६ (IST) ek12cydhb6tlrh1c5o6hxbf5194j793 सदस्य चर्चा:Omkartagade 3 111965 236308 2026-08-29T07:28:57Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 236308 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Omkartagade}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १२:५८, २९ ऑगस्ट २०२६ (IST) gkfgag2tpmsah7lpd5xm09flnx3f8tk पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३० 104 111966 236310 2026-08-29T09:11:21Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236310 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११० |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>{{gap}}खरोखरी अनुराद्धपुरासारखी शतकेच्या शतकें असलेली वैभवसंपन्न राजाची राजधानी पहाण्यास आठवडेच्या आठवडे घालविले तरी पुरे पडणार नाहींत. मग एक दोन दिवसांत शहर कितीसें पाहून होणार; पण सकाळ संध्याकाळ तीन तीन तास चालून मला जितके पाहतां आलें तितकें मीं तें शहर पाहिलें. त्यावरून त्या जुन्या राजधानीच्या पूर्व वैभवाची त्यांतील बांधकला, खोदकला व मूर्तिकला या ललितकलांच्या मासल्याची व एकंदर पूर्वकाळच्या सुधारणेची उत्तम कल्पना मला आली यांत शंका नाहीं. या शहरांतील प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन कितीही केलें तरी तीं स्थळें संपावयाचीं नाहींत तेव्हां झालें वर्णन तेवढ्यांत समाधान मानून पुढच्या मिहिंतले पर्वताचें वर्णनास लागणें बरें.
{{gap}}महेन्द्र पर्वत अथवा हल्लीचें नांव मिहिंतले हे स्थळ त्रिंकोमालीच्या रस्त्यावर अनुराद्धपुरापासून आठ मैलांवर आहे. प्रथम मी या रस्त्यानें अनुराद्धपुरांत आलों त्यावेळींच या गर्द झाडीनें शोभायमान झालेल्या पर्वतराजीचें दुरून दर्शन घडलें होतें. पण पर्वतावर चढून तेथली प्रेक्षणीय स्थळे पाहण्यास मी मोटारीने गेलों. हें माझें दृश्यदर्शन सिगिरीया दर्शनाप्रमाणे एकाकीं व घाईघाईनें झालें नाहीं; तर मित्र- मंडळींच्या मेळ्यानें झालें. यामुळे दृश्यदर्शनाचा आनंद द्विगुणीत झाला.
{{gap}}मी त्रिंकोमालीहून अनुराद्धपुरच्या रा. विक्रमरत्न नांवाच्या एक्साईस इन्स्पेक्टरला रा. बालसिंघम जवळून परिचयपत्र घेतलें होतें. अनुराद्धपुरला पोहोंचल्याबरोबर व हॉटेलमध्ये उतरल्याबरोबर मी तें पत्र त्या गृहस्थांकडे पाठवून दिलें. पत्र मिळाल्यावर ते गृहस्थ मला येऊन भेटले व त्यांनी "मिहिंतलेला जाण्याकरितां दुसरे दिवशीं सकाळीं आठ वाजतां मी मोटार घेऊन येतों" असें सांगितलें. त्याप्रमाणें दुसरे दिवशी सकाळीं न्याहारी करून मी तयार होतों तोंच विक्रमरत्न आपली बायकामंडळी व मित्रमंडळी यासकट दोन मोटारी घेऊन आले. मग आम्ही लागलीच मिहिंतले पर्वतास जाण्यास निघालों. त्रिंकोमालीरस्त्यानें आठ मैल<noinclude></noinclude> 3t52xs0ivpttod8nr7xuqjeop9m3jst पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३१ 104 111967 236311 2026-08-29T09:13:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236311 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|१११ }}</noinclude>मोठ्या बागेमधून आपण चाललों आहोंत असें वाटतें; आठव्या मैलाशीं मिहिंतले पर्वताकडे जाणारा रस्ता उजव्या बाजूस फुटतो. गांवांतून पलीकडे गेलें म्हणजे दाट व उंच उंच वृक्षांचें उपवन लागतें व मोटार थेट पर्वताचे पायथ्याच्या पायऱ्याशीं जाते.
{{gap}}मिहिंतले पर्वत हा सिगिरिया किंवा दांबूल यासारखी एकाकी चारपांचशें फुटच उंचीची निर्वृक्ष खडकाची टेकडी नाहीं; तर ही एक बरीच लांब पर्वतराजी आहे; तिची उंची हजार बाराशे फुटांचे वर असून तिच्यावर खूप गर्द असें रान आहे.
{{gap}}या पर्वतराजीचे एका शिखरावर बुद्धधर्मी पुष्कळ देवळें व स्मारकें आहेत. दंतकथात्मक प्रकरणांत उल्लेख केला आहे की पर्वतावर देवानांपियतिस्स राजा शिकार करीत असतां या पर्वत शिखरावर अशोकाचा मुलगा महेन्द्र हिंदुस्थानांतून आकाशमार्गे उतरला व त्यानें राजास बौद्धधर्माचा उपदेश केला. तेव्हांपासून हा पर्वत पवित्र बनला व तेथें देवळें व विहार बांधण्यांत आले. व पर्वतावर यात्रेकरूंना सुखानें चढतां यावें म्हणून अठराशें दगडी पायऱ्या बांधण्यांत आल्या. आम्हीं मोटारींतून उतरलों व लागलीच त्या प्रशस्त पायऱ्या चढूं लागलों. केवढ्या रुंदच रुंद त्या पांढऱ्या दगडाच्या पायऱ्या व सभोवार ती हिरव्यागार वृक्षाची गर्द राई! हा देखावा मोठा चित्ताकर्षक वाटला. आम्ही सारख्या पायऱ्या चढत होतों; पण पायऱ्या संपतात कसच्या! या अनंत पायऱ्या जणूं कांहीं स्वर्गद्वारापर्यंत पोहोंचल्या आहेत असा भास होतो. चढतांना विसांवा घेण्याकरितां मधून मधून सपाट फरसबंदी रुंद असे टप्पे ठेवलेले आहेत. त्यामुळें त्या त्या टप्यावर आलें कीं, साहजिक थांबावयास सांपडे व आल्या मार्गाचें व सभोवारच्या देखाव्याचें सिंहावलोकन करावयास सांपडे. पुढे बांधलेल्या पायऱ्या सरून खडकांतून खोदलेल्या अरुंद पायऱ्या लागतात. या चढण्यास बरेच श्रम व त्रास पडतो. कारण, यावर सबंद पायही रहात नाहीं; इतक्या अरुंद या खोद-पायऱ्या आहेत.{{nop}}<noinclude></noinclude> bimkbm6db431ohpax43sxg4pe9ssw0p पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३२ 104 111968 236312 2026-08-29T09:16:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236312 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>{{gap}}शेवटी एकदां असंख्यप्राय पायऱ्या संपतात व श्रमानें धापा टाकणारा प्रवाशी एकदांचा बऱ्याच मोठ्या सपाट प्रदेशावर येतो. येथें नारळाच्या सुंदर झाडांची राई प्रवाशाचें मन प्रसन्न करते. त्या शीतल, शांत व गर्दछायेच्या ठिकाणी आल्याबरोबर मोठा पर्वत चढण्याच्या श्रमाचा परिहार होतो. येथेंच बूट टोपी काढून ठेवावी लागते. मग '''अंबस्थले''' नांवाच्या दागबाचें दर्शन घेतां येते. हें अनुराद्धपुर येथील थूपाराम दागबाप्रमाणें छोटेच पण उत्तम स्थितींत असलेलें बुद्धाचें देऊळ आहे. त्याचे सभोवार पूर्वी सभामंडप किंवा प्रदक्षिणामंडप असावा; त्याचे खांबच फक्त उभे असलेले दिसतात; पण देऊळाचा तो नीळसर रंग व सभोवारच्या वृक्षाचा तो हिरवा रंग व पांढरसर तांबूस रंगाच्या खांबाची वाटोळी रांग हा देखावा एकसमयावच्छेदेंकरून पाहिला म्हणजे या बुद्धधर्मी पवित्र स्थळाचा मनावर फार अनुकूल परिणाम होतो असा माझा अनुभव आहे. हा दागबा देवानांपियतिस्स राजाला महिन्द्र ज्या जागेवर भेटला त्या खुद्द जागेवर बांधलेला आहे. या सपाट प्रदेशाच्या जवळच शंभर सवाशें फूट उंचीचा एक खडकाचा सुळकाच्या सुळका आहे. हा मात्र सिगिरीयाप्रमाणें उभाच आहे. यावर जाण्याकरितां खडकांत पायाचा चवडा राहील इतक्या अरुंद पायऱ्या खोदल्या आहेत; व लोखंडी कठडा आधारास केलेला आहे. पण हा लोखंडी कठडा आतां डळमळीत झालेला आहे. यामुळें त्याच्यावर भार टाकतां येत नाहीं. तेव्हां हातपायाच्या आधाराने या उभ्या व बिकट खडकाच्या माथ्यावर जावें लागतें. मध्यें खडकाला केवढी तरी मोठी भेग पडलेली आहे ती वलांडून जातांना फार भय वाटतें. हा चढाव थोडा शंभर फूट उंचीचा आहे खरा; पण तो सिगिरीया किल्याप्रमाणें फार बिकट व भोंवळ आणणारा आहे. पण हा बिकट चढाव चढून एकदांचे आम्हीं त्या खडकाचे माथ्यावर आलों. या पर्वताचें हें सर्वात उंच शिखर होय. येथून सभोवारचा सपाट सुपीक भाताच्या शेतांनीं शोभायमान दिसणारा हिरव्या हिरव्यागार वृक्षांनी व बागांनीं भरलेला प्रदेश फार मनोहर<noinclude></noinclude> lg39iqtayw8vd1vkgojqu18y5jaj1y4 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३३ 104 111969 236313 2026-08-29T09:17:55Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "
{{center|'''अंबस्थले दागबा, मिहिंतले.'''}} {{rh|नं. १४||पान ११२}} {{nop}}" 236313 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|'''अंबस्थले दागबा, मिहिंतले.'''}} {{rh|नं. १४||पान ११२}} {{nop}}<noinclude></noinclude> dxt8z3ubp0mbc7nt7wzogi7stz0if1g पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३४ 104 111970 236314 2026-08-29T09:20:51Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236314 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंकेच्या जुन्या राजधान्या व मिहिंतले पर्वत|११३ }}</noinclude>दिसतो यांत शंका नाहीं. तसेंच जिकडे तिकडे पांढऱ्या शुभ्र पाण्याचे लहान मोठे तलाव त्या हिरव्यागार भूमिभागांत मोठे मजेदार दिसतात. या खडकावर महेन्द्र प्रथम उतरला अशी भाविक बौद्ध लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या माथ्यावर यात्रेकरू आल्याखेरीज रहात नाहीं. या खडकावरून परत खालीं आल्यावर जरा खालच्या बाजूस दुसरा असाच खडकावर खडक असलेला एक भाग आहे. हा भाग त्रिंकोमालीच्या स्वामी खडकासारखा आहे. येथून खाली मोठी दरी आहे व ती नारळी केळी पोफळी अशा प्रकारच्या झाडांनीं गर्दछाय झालेली आहे.
{{gap}}अनुराद्धपुराप्रमाणे या पर्वतावरही किती तरी जुनीं प्रेक्षणीय स्थळें आहेत. तीं सर्व पहाण्याच्या फंदांत आम्ही पडलों नाहीं. कारण आतां सूर्य बहुतेक डोक्यावर आला व आम्हांला रा. विक्रमरत्न यांचे बंगल्यावर दोन प्रहरच्या फराळास जावयाचें होतें. म्हणून आम्ही परत फिरलों. पहिला टप्पा उतल्यावर आम्हीं जरा बाजूस असलेलीं व मागें वर्णन केलेली सिंहस्नानगृह व नागकुंड हीं पाहून त्या बाजूनें खालीं येण्यास निघालों. कारण तिकडे डोंगर फार खडा नसून त्यावर खूप झाडी होती. यामुळें पाऊलवाट सोपी व सांवलीची होती. त्या पायवाटेनें आम्ही तळाशीं आलों; मग लागलीच मोठ्या प्रमुदित मनानें मोटारींत बसून आम्ही मार्गस्थ झालों. बंगल्यावर परत येतांना तिसावेवा या सुंदर सरोवराच्या बांध वरील हिरव्यागार सडकेनें परत आलों. ही सडक जवळ जवळ एक मैल आहे. या सडकेनें मोटारमधून जातांना फारच मनोहर देखावा दिसतो. डाव्या हातास तो प्रचंड तलाव, हिरव्यागार गवतानें शोभायमान झालेला तो मातीचा बंधारा, मधली ती तांबड्या मातीची सुबक सडक व बंधाऱ्या खालचीं तीं हिरवीं हिरवीगार भाताचीं शेतें व केळी-नारळीच्या बागा हा देखावा फारच मनोवेधक वाटतो यांत शंका नाहीं.
{{gap}}बंगल्यावर परत आल्यावर बोलत चालत आमचा फराळ झाला. रा. विक्रमरत्न यांच्या मित्रमंडळींत तीन चार लोक पुण्या-मुंबईमध्यें शिक्षणाकरितां राहिलेले होते. यामुळे बोलण्यास विषयाचा तोटा<noinclude></noinclude> asu357r2nicom2mimrtz7cf2qv16mnv पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३५ 104 111971 236315 2026-08-29T09:23:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236315 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>नव्हता. दोन प्रहरचा फराळ झाल्यावर मी हॉटेलमध्यें जाऊं लागलों. पण ती मंडळी कसची मला सोडतात? रा. विक्रमरत्न म्हणाले "आतां आपण थोड्या वेळाने चहा घेऊं व मग बाहेरील वाटोळ्या सडकेनें आपण मोटारीनें सहल करीत जाऊं म्हणजे अनुराद्धपुरांतील जुन्या बांधकलेचे अवशेष ओझरते पहातां येतील व मग सायंकाळीं आपण आपल्या हॉटेलांत जा."
{{gap}}माझ्यासारख्या प्रवासप्रिय माणसाला दृश्यदर्शनाचें आमिष पुरें होतें. अर्थात् मी तो सर्व वेळ विक्रमरत्न यांचे बंगल्यांत घालविला. चहापानानंतर आम्हीं पुनः मोटारींत बसून बाहेर पडलों व मग अनुराद्धपूर या जुन्या विस्तीर्ण राजधानीचें व विहार, दागबा राजवाडे वगैरे नानाविध इमारतींच्या अवशेषांचें धांवतें दर्शन घेतलें. शेवटीं रुनवेली दागबाच्या माथ्यावर चढलों व सभोंवारच्या सुंदर देखाव्याचें अवलोकन करून आम्ही खालीं उतरलों तों सायंकाळ झाली. तेव्हां मोटारी सेंट्रल हॉटेल समोर आणण्यांत आल्या. तेथें मी सर्व मंडळीचा निरोप घेतला व मग मोटारींतून खाली उतरलों. रा. विक्रमरत्नांचे त्यांनीं केलेल्या पाहुणचाराबद्दल आभार मानून मी आपल्या खोलींत आलों.
{{gap}}झालें. येथें माझें जुन्या तीन स्थळांचे वर्णन संपलें. दुसरे दिवशीं बाराच्या आगगाडीनें मीं लंकेतील अगदीं उत्तरेकडचें मोठं व जुनें शहर '''जाफना''' हें पाहण्याकरितां मार्गस्थ झालों.

{{rule|5em}}{{rule|7em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> tawmcuqg7dthtii4r524k5jewzxqas7 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३६ 104 111972 236316 2026-08-29T09:27:42Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236316 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ८ वें'''}}}} {{rule|7em}} {{center|{{x-larger|'''जाफना अथवा नागद्वीप.'''}}}} {{rule|5em}}
{{gap}}{{x-larger|'''ता.'''}} २१ डिसेंबर सन १९३३ रोजीं दोन प्रहरच्या एक वाजतांच्या ता. आगगाडीनें मी लंकेच्या उत्तरेकडील मोठे व जुनें शहर '''जाफना''' येथें जाण्यास निघालों. अनुराद्धपुरपासून जाफना १२० मैल आहे. जाफनास पोहोंचण्यास साहा तास लागतात. नाताळच्या सवलतीच्या सेकंड क्लासच्या परत तिकिटास सात रुपये पडले.
{{gap}}अनुराद्धपूर हे लंकेच्या मध्यप्रांताचें मुख्य शहर आहे. हा प्रांत अगदी सपाट पण सुपीक आहे. पूर्वकाळीं तो दाट वस्तीचा व उत्तम लागवडीचा प्रांत होता. पण हल्लीं तो बहुतेक अरण्यमय झाला आहे. तुरळक तुरळक भाताची शेतें व नारळीकेळीच्या बागा लागतात; लहान मोठे तलावही लागतात. दीड दोन तासांनी '''मडवाचीया''' नांवाचें जंक्शन स्टेशन लागते. येथून एक रेलवे रस्ता वायव्य दिशेनें मानार बेटामधून तलाईमानार या लंकेच्या रेलवेरस्त्याच्या शेवटच्या स्टेशनपर्यंत जातो. येथूनच दक्षिण हिंदुस्थानच्या धनुष्कोडी स्टेशनला आगबोटीनें जातां येतें; दुसरा रेलवे रस्ता थेट उत्तरेस '''जाफना व कंकेसंतुराई''' या जाफना द्वीपकल्पाच्या उत्तर टोकाच्या शेवटच्या गांवापर्यंत जातो. अर्थात् '''मडवाचीया''' हे जंक्शन स्टेशन बरेंच मोठें आहे. आमची गाडी थेट कंकेसंतुराईला जाणारी होती; म्हणून मला येथें गाडी बदलावी लागली नाहीं; दक्षिण हिंदुस्थानाला जाणाऱ्या प्रवाशांना येथें गाडी बदलावी लागते. आमच्या डब्यांत सर्व मंडळी जाफनास जाणारी होती; म्हणून कोणीही येथें उतरलें नाहीं. मडवाचीया स्टेशन टाकलें, म्हणजे जंगलमय भाग कमी होऊन लोकवस्ती व लागवड जास्त प्रमाणांत दिसून येऊं लागली. हा सर्व भाग दक्षिण हिंदु-<noinclude></noinclude> bcczdog5wr9pz0wjjnkb9npyirglff7 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३७ 104 111973 236317 2026-08-29T09:31:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236317 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>स्थान किंवा आपल्या इकडील अष्टागर या भागासारखा थेट दिसला. आतां तांबडी माती जाऊन रेताड पांढुरक्या मातीचा भूमिभाग लागला. भातशेती जास्त प्रमाणावर दिसून येऊ लागली. नारळी पोफळीच्या बागाही खूब लागूं लागल्या. पालमिरा पाम नांवाच्या नारळीच्या सारख्या झाडांच्या राया दिसूं लागल्या. हीं झाडें शेताच्या बांधावर व माळावर लावलेली दिसत होतीं.
{{gap}}आतां स्टेशनें फार लवकर लवकर येऊ लागली; तसेंच तीं मोठीं नीटनेटकीं व सुंदर दिसत; स्टेशनला लागून चांगलीं सुबक घरें व दुकानें हीं दिसत. यावरून हा भाग फार दाट वस्तीचा असला पाहिजे असें मला वाटलें. '''किलिनाची व पॅरॅन्थम्''' हीं मोठीं सुंदर व सुबक स्टेशनें वाटली. पुढें पांढरा पांढरा शुभ्र वालुकामय प्रदेश लागला; व शांत, हिरवट रंगाच्या पाण्याचें खारें सरोवर आलें. हें सरोवर म्हणजे जाफना द्वीपकल्प व लंकाबेट यामधील समुद्राचा चिंचोळा फाटा होय. तो रस्त्याचे दोन्ही बाजूंस दिसूं लागला. व लगेच '''एलिफंटपास''' नांवाचा सरोवरावरील बैठा पूल आला. हा पूल माहिम व वांद्रे यामधील खाडीवरील पुलासारखा ठेंगणा बैठा पूल आहे; पण माहिम व वांद्र्यासारखें घाणेरडें खारटण येथें नाहीं. रेलवे-रस्त्याच्या दोन्ही बाजूंस सुंदर तलावाचें शांत व निळसर हिरवट पाणीच पाणी आहे. यामुळें येथें मोठा मनोहर देखावा दिसतो. या पुलावरून गेलें कीं, जाफना किंवा त्याचें संस्कृत नांव नागद्वीप या प्रांतांत आगगाडी येते. दोन तीन स्टेशनें लवकर लवकरच लागतात व मग जाफना स्टेशन येतें. आमची आगगाडी जाफना स्टेशनला सात वाजतां पोहोंचली. त्रिंकोमालीच्या रा. बालसिंघम या माझ्या नव्या मित्रानीं जाफनास असलेल्या आपल्या चुलत्यांना (यांना सरकारनें मुदलीयार ही पदवी दिली आहे.) माझ्याबद्दल आधींच पत्र लिहिलें होतें. त्यामुळें मोटार घेऊन ते गृहस्थ स्टेशनवर मला नेण्यास आले. ते स्टेशनवर भेटल्यामुळे माझी उतरण्याची उत्तम व्यवस्था झाली. त्यांच्या एका नातलगानें आपले घरीं एक छोटेसें देवालय बांधलें होतें.<noinclude></noinclude> 2olvoz4l38cqv96p2f08vz5tcon0b4d पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३८ 104 111974 236318 2026-08-29T09:36:06Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236318 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जाफना अथवा नागद्वीप|११७ }}</noinclude>आपले पश्चात् ती सर्व जागा व घर त्यांनीं सार्वजनिक उपयोगाकरितां मुदलीयरांचे स्वाधीन केलें होतें; म्हणून येथें छोटेसें पुस्तकालय व वाचनालय ठेवण्यांत आलें होतें; एका वाङ्मयीन सभेच्या बैठकी येथल्या दिवाणखान्यांत भरत असत; व एक बहुश्रुत स्वामी येथें रहात असत; व ते ''''कलानिलय'''' नांवाचें मासिक तामीळ भाषेंत चालवीत असत. अशा सुशिक्षित समाज जमण्याच्या ठिकाणीं माझी राहण्याची सोय मुदलीयार यांनीं केली. यामुळें जाफनामधील पुष्कळ सुशिक्षित मंडळीच्या सहज गांठी पडल्या. स्वामी महाराजाशी चांगला स्नेह जमला व यामुळे जाफनास माझा निवास एक दोन दिवसांनी वाढला. तेव्हां जाफनाच्या माझ्या निवासाचें व दृश्यदर्शनाचें वर्णन रोजनिशीवार करणेंच बरें. पण विशिष्ट प्रेक्षणीय स्थळांचें वर्णन करण्यापूर्वी जाफना द्वीपकल्पाचें सामान्य स्वरूप सांगणें योग्य होईल.
{{gap}}ज्याप्रमाणें लंकेच्या वायव्य दिशेस मानार हे बेट असून तें हल्लीं आगगाडीच्या पुलानें व मोटार गाडीच्या कॉजवेनें लंकेला जोडलेलें आहे, त्याप्रमाणें जाफना हे लंकेच्या थेट उत्तरेस असलेलें एक बेटच आहे. तें आग्नेय (पूर्व-दक्षिण) टोकाकडे अत्यंत अरुंद- पुरा एक मैलही ती रुंदी नसेल- अशा जमीनीच्या पट्टीनें व एलिफंटपास येथील आगगाडीच्या व मोटार गाडीच्या ठेंगण्या पुलांनीं मुख्य लंका बेटाशी जोडलेलें आहे. म्हणून त्याला द्वीपकल्प म्हणणें प्राप्त आहे; बाकी जाफनाच्या सर्व बाजूंस समुद्र आहे. या द्वीपकल्पाचा आकारही विलक्षण आहे. लंकेच्या ईशान्य (पूर्व उत्तर) टोंकास जोडणारी एक मैलाची अत्यंत चिंचोळी जमीनीची पट्टी रुंदावत जाऊन तिचा जाफना शहराशीं बारा मैल रुंदीचा पट्टा बनतो. म्हणजे हा द्वीपकल्पाचा तुकडा सदऱ्याच्या कळीच्या आकाराचा असून तो मुख्य लंकाबेटाचे डोक्यावर जणूं कांहीं टांचणीनें अडकवून ठेवला आहे. या कळीवजा द्वीपकल्पाच्या पश्चिमेस पांच-सहा लहान मोठी बेटें एकमेकांनजीक आहेत व तीं अर्थात् या जाफना द्वीपकल्पामधेच मोडतात. याच बेटांपैकीं '''लेडन''' नांवाच्या लांबट बेटां-<noinclude></noinclude> h0ec74bhi8flhoxw92gwjorf3932thw पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३९ 104 111975 236319 2026-08-29T09:40:24Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236319 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|११८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>वर काईट्स म्हणून एक बंदर व शहर आहे; हेंच जाफना द्वीपकल्पाचें खोल व शांत पाण्याचें बंदर होय.
{{gap}}या द्वीपकल्पाचें हवा पाणी व निसर्गस्थिति थेट दक्षिण हिंदुस्थानासारखी आहे. येथील वस्तीही दक्षिण हिंदुस्थानांतील तामीळ लोकांचीच आहे. या द्वीपकल्पाची पूर्वपरंपरा व इतिहास लंकेच्यापेक्षां अगदीं वेगळा व स्वतंत्र आहे. पण या द्वीपकल्पाची पूर्वपीठिका किंवा सद्यःस्थिती. पाहिली म्हणजे असें वाटतें कीं, दक्षिण हिंदुस्थानचा एक लचका काढून निसर्गदेवीनें तो एका बारिक धाग्यानें लंकेला जोडून दिला; म्हणून त्याला लंकेचा एक प्रांत म्हणावयाचा. बाकी येथला निसर्ग- देखावा लंकेच्याहून वेगळा; येथली हवा वेगळी येथलें ऋतुमान वेगळें येथल्या चालीरीती व संस्कृती वेगळी. सारांश, जाफना भौगोलिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या लंकेंत मोडतें खरें; पण तें एक वेगळें व स्वतंत्र बेट आहे असें प्रवाशास वाटल्याखेरीज रहात नाहीं. येथल्या तामिळ संस्कृतीला विलायती पोशाखाचें वावडें आहे असें कळल्यावरून मी तो पोशाख टाकून धोतरटोपीचा साधा पोशाख स्वीकारला तो दक्षिण हिंदुस्थानचें पर्यटन आटपून ट्यूटिकोरिन येथें येईपर्यंत सारखा वापरीत होतों. या एका गोष्टीवरून जाफना हे लंकेपेक्षां किती वेगळें आहे हें दिसून येईल. तारिख २१ डिसेंबर १९३३ रोजीं मी जाफनास सायंकाळी सात वाजतां पोहोंचलों म्हणून सांगितलें आहे. त्या सायंकाळीं वाचनालयांत आलेल्या मास्तर मंडळीशीं मुदलीयार यानी माझा परिचय करून दिला. जाफना हें शिक्षणाचें मोठें केन्द्र असून येथें लंकेंतील सर्वांत जुनें हायस्कूल आहे व त्याचा शतसांवत्सरिक समारंभ लवकरच आहे असें मला कळले; तसेंच या ठिकाणीं शिक्षणाचा प्रसार पुष्कळ झाला असून सर्व लंकेभर येथील सुशिक्षित लोक निरनिराळ्या सरकारी खात्यांत नोकरीस राहिलेले आहेत असें मला कळलें. स्वामीजींचा परिचय करून देण्यांत आला. ते गृहस्थ बहुश्रुत असून बराच प्रवास केलेले असल्यामुळें त्यांचा माझा स्नेह ताबडतोब जमला.{{nop}}<noinclude></noinclude> bebsohtr1f1cx33sgrxbieavxdi0kac पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४० 104 111976 236320 2026-08-29T09:43:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236320 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जाफना अथवा नागद्वीप|११९ }}</noinclude>{{gap}}ता. २२ डिसेंबर सन १९३३ सकाळीं इटली, दोशे व काफी असा शुद्ध तामीळ पद्धतीचा फराळ झाल्यावर मी कांहीं मास्तर मंडळींबरोबर मोटारींतून जाफना शहराच्या थेट उत्तरेस असलेल्या संतुराई या गांवाला गेलों. जाफना हे किती दाट लोकवस्तीचें द्वीपकल्प आहे; तसेंच या भागांतील लोक किती उद्योगी व कष्टाळू असून ते भातशेती व बागायती पिके काढण्यांत किती वाकबगार आहेत याची उत्तम कल्पना या रस्त्यानें जातांना आली. या बारा मैलांत मला कोठेंही ओसाड, नापीक, पडिक जमीन दृष्टीस पडली नाहीं; तसेंच एक खेडेगांव संपून दुसरें कोठें लागलें हें कळलें नाहीं; बारा मैलामध्यें घरें, बागा व भातशेती अशी सारखी रांगेनें लागत होती. प्रत्येक घराच्या आवाराला नीटनेटकें व बंदिस्त कुंपण आहे असें पाहिलें. येथलीं कुंपणें तरी किती सुबक व बंदिस्त! कुंपण काटेरी कोरड्या वाळलेल्या डांभ्याचें न करितां जीवंत झाडाचें करण्याची रीत दृष्टीस पडली. तें झाड म्हणजे भेंडीचें झाड होय. येथें भेंडीच्या झाडाचें बारिक सरळ सोट साहा इंचांचें अंतरानें कुंपणाच्या डांभ्यावजा लावतात; एका पावसाळ्यांत जीव धरून त्यांना वर पानांचा झुपकाच्या झुपका फुटतो. हे सोट फार दाट लावल्यामुळे ते फार वाढत नाहींत, किंवा त्यांचा फाजील विस्तार होत नाहीं; पण माथ्यावरील हिरव्यागार पानाचा झुबका मोठा सुंदर दिसतो. त्यानें कुंपणीचा वरचा भाग फार गर्दछाय व हिरवागार राहतो.
{{gap}}भेंडीच्या जित्या डांभ्यांना एकावर एक असे दोन दोन झाप (नारळीच्या पानाचे विणलेले) सुंभानें बांधून टाकतात. यामुळें आवाराला पूर्ण बंदिस्ती येऊन बाहेरच्या माणसास आंतील कांहीं एक दिसत नाहीं व आवाराला भिंतच जणूं कांहीं घातली आहे असें वाटतें. खरोखरी या कुंपणीचें मला नवल वाटलें; व येथल्या सामान्य लोकांच्या नीटनेटकेपणाबद्दल कौतुक वाटलें. या भेंडीच्या डांभ्याच्या कुंपणी सुबक व बंदिस्त असून त्यांच्या विपुल पानांचा शेताला हिरव्या खताकरितां उपयोग करतां येतो असें मला कळलें. भेंडीच्या पानानीं भरगच्च भरलेल्या बैलाच्या गाड्या शेताकडे जातांना मीं प्रत्यक्ष पाहिल्या.<noinclude></noinclude> sujd8rk0sy4kdhwu73jyr629x7wqwcm पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४१ 104 111977 236321 2026-08-29T10:22:42Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236321 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२० |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>हीं भेंडीची पानें शेत नांगरतांना जमीनीमध्यें टाकलीं म्हणजे तीं कुजून त्यांचे शेताला चांगलें खत होतें हें मला प्रत्यक्ष दिसून आलें.
{{gap}}या भागांतील भेंडीपेक्षांही जास्त उपयोगी झाड म्हणजे पालमिरा पाम नांवाचें झाड होय. हे झाड शेतकऱ्यांना हजारों तऱ्हेनें उपयोगी पडतें. तामीळ भाषेत तर यालाच कल्पवृक्ष म्हणतात. एका मार्गदर्शक पुस्तकांतील खालील उताऱ्यावरून या झाडांच्या उपयुक्ततेची कल्पना होईल.
{{gap}}"या झाडांच्या पानांनीं छप्पर व कुंपण करतां येतें. या झाडांच्या पानापासून चटया, टोपल्या, छत्र्या व पंखे करतात; याचे कुजल्यावर चांगलें खत होतें. पूर्वी या झाडांच्या पानांवर खोदून अक्षरे काढीत व त्यांच्या पोथ्या करीत; या झाडांचीं फळें भाजींत घालतात व त्यांचें वाळवून पीठ करतात; या फळांच्या कवटीचें चांगलें जळण होतें. या झाडांच्या रसापासून गूळ व दारू होते; या झाडाचें लाकूड कठीण असतें व त्यापासून लाकडी सामान व घरांचें वासिक व छप्पर करतात; या झाडांचें आयुष्यही हजारों वर्षांचें आहे व याचें लाकूडही तितकेंच टिकाऊ आहे." अशा उपयुक्त झाडांची लागवड शेतकऱ्यांनीं जागा सांपडेल तेथें करावी हे स्वाभाविक आहे.
{{gap}}याप्रमाणें नाना प्रकारच्या वस्तूंचें व लोकस्थितीचें अवलोकन करीत बारा मैलांचा रस्ता केव्हां संपला हे मला कळलें सुद्धां नाहीं. '''कंकेसंतुराई''' हें गांव लंकेच्या उत्तरेकडच्या समुद्रकिनाऱ्यावर आहे. येथून हिंदुस्थानचा किनारा फक्त वीस बावीस मैल दूर रहातो. पूर्वकाळीं येथूनच गलबतानें हिंदुस्थानला लोक जात येत असत. आतां तलाई मानार कडून रेल्वेनें जाणें येणे सोयीचें व सोपें झालें आहे खरें पण जाफना द्वीपकल्पास प्रवास लांबीचा व खर्चाचा झाला आहे. पूर्वकाळीं गलबतानें एका रात्रीत हिंदुस्थानाला जावयास सांपडत असे. कंकेसंतुराईपासून समुद्र किनाऱ्यानें एक रस्ता पूर्वेकडे जातो; या रस्त्यानें फार सुंदर देखावा दिसतो; आपल्या डाव्या हातास तो हिरवट रंगाचा<noinclude></noinclude> qvhjsw6rg0947sbj5igb438m05d8st8 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४२ 104 111978 236322 2026-08-29T10:27:28Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236322 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जाफना अथवा नागद्वीप|१२१ }}</noinclude>मंदमंद लाटांचा समुद्र व त्याच्याकडेचें तें केशरी रंगाचें वाळवंट; मधला तो तांबडा रस्ता व सभोवार पालमिरा पामचीं तीं झाडेच झाडें हा देखावा चित्ताकर्षक आहे. या रस्त्यानें आम्हीं '''पालेगांवा'''पर्यंत गेलों. तेथें अगदी समुद्रकांठावर शुद्ध हवाशीर खुल्या जागीं सातव्या एडवर्ड बादशाहाच्या स्मारकार्थ सॅनिटेरियमचीं गृहें (क्षयरोग्याकरितां आरोग्यगृहें) बांधण्यांत आली आहेत. तीं आम्हीं पाहिलीं. ती हवाशीर जागा अशा गृहांना फार योग्य आहे हें तें स्थळ पहातांक्षणीं माझ्या ध्यानांत आलें. याप्रमाणे सुमारें दोन तास जाफना द्वीपकल्पाचा उत्तर भाग पाहून मग आम्हीं कंकेसंतुराईच्या पश्चिमेस दोन मैलांवर असलेल्या '''किरीमलाई''' नांवाच्या नैसर्गिक पुष्करणीशीं स्नान करण्याकरितां आलों. ही पन्नास फूट लांब रुंद व दहा बारा फूट खोल अशी उत्तम कोरल दगडाची चौकोनी दहा दहा पायऱ्याची बांधलेली पुष्करणी आहे. या पुष्करणीमध्यें नेहेमीं पांचच फूट पाणी राहील अशी व्यवस्था केलेली आहे. या पुष्करणीचे तळाला स्फटिका सारखी शुभ्र वाळू आहे. या पुष्करणीच्या तळाशी एका बाजूला वाहता झरा आहे व वालुकामय तळांतून पाण्याचे पाझर असावे; झऱ्याचें पाणी स्वच्छ पण किंचित् पोपटी रंगाचें आहे. हा झरा फार मोठा आहे. पुष्करणीच्या एका बाजूस पाणी जाण्यास वाट ठेवली आहे. त्यानें पाणी बाहेर पडून त्याचा लहानसा ओढा बनला आहे व तो समुद्राला जाऊन मिळालेला आहे. किती आश्चर्यकारक हा झरा व ही पुष्करणी आहे! या झऱ्याचें पाणी खारें नाहीं. गोडे आहे पण किंचित् मचूळ लागतें, परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा गोड पाण्याचा झरा समुद्रापासून पुरा पन्नास फूटही दूर नसेल! ही पुष्करणी व हा विपुल पाण्याचा झरा म्हणजे एक सृष्टिसुंदरीनें बनविलेले पोहण्याचें जलमंदिर होय यांत शंका नाहीं. किती तरी लोक या पुष्करणींत पोहत होते. आम्हींही येथें अर्धाअधिक तास पोहत राहिलों. या ठिकाणची हवा कोरडी असल्यामुळें व या पुष्करणीचें पाणी युरोपांतील '''स्पा''' (आरोग्यवर्धक<noinclude></noinclude> qj7wepdco7qblfvdnni7uiw64x7sj2u पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४३ 104 111979 236323 2026-08-29T10:30:17Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236323 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>पाण्याची ठिकाणें) प्रमाणें आरोग्यवर्धक व रोगहारक असल्यामुळें दूरदूरचे लोक येथें महिना महिना येऊन राहतात व येथल्या पुष्करणींत दररोज दोनदां स्नान करतात; स्नानानें व येथल्या उत्तम हवेनें लोकांची प्रकृति लवकर सुधारते असें मला कळलें. ही माहिती ऐकून तर मी आश्चर्याने थक्क झालों व हा झरा म्हणजे या प्रांताला एक मोठी निसर्गदत्त बिनमोल देणगी होय असें मला वाटलें. पोहोणें व आंघोळी आटोपून आम्ही बारासाडेबारा वाजतां बिऱ्हाडीं आलों.
{{gap}}सायंकाळीं काफीपानानंतर आम्ही चारपांच मंडळी जाफना शहराचें बंदर व नवी केलेली जमीन (Reclamation) पाहण्यास गेलों. क्षार सरोवराच्या बाजूला दगडी धक्का बांधून मुंबईच्या बॅकबेकडील नव्या जमिनीप्रमाणें ही नवीन जमीन तयार केली आहे. धक्यावरून गेलें म्हणजे डावे अंगास सरोवराचें नीळसर हिरवट पाणी उजवे अंगास सपाट पांढरट तांबूस नवीन जमीन, त्याचेपलीकडे हिरव्यागार बागा व तांबड्या इमारती हा देखावा चित्ताकर्षक आहे यांत शंका नाहीं.
{{gap}}बंदरांत बरीच गलबतें नांगरलेली दिसत होतीं. या बंदरावरून आम्हांला येथल्या सूर्यास्ताचा देखावा मोठा मजेदार दिसला. जसजसें सूर्यबिंब सरोवराच्या पाण्याजवळ व क्षितिजासंन्निध येऊं लागलें तसतसें तें तांबडें तांबडेंलाल दिसूं लागलें; व त्यानें दशदिशांना आपल्या समवर्ण करून टाकलें. इतक्यांत सूर्यबिंबाची खालची बाजू सरोवरांत बुडाली व हां हां म्हणतांम्हणतां सर्व बिंब पाण्यांत बुडालें; व त्यानें सरोवराचें पाणी लालच- लाल करून टाकलें.थोड्याच वेळांत तांबडा रंग कमी होऊन सर्वसृष्टि काळवंडूं लागली! जणूं कांहीं सूर्यनारायण अस्तास गेल्यामुळे दुःखानें सृष्टिसुंदरीचें मुख म्लांन झालें व त्यावर दुःखाची काळसर छाया पडली! असा हा सूर्यास्ताचा मनोहर देखावा पाहून आम्ही परत बिऱ्हाडीं आलों.
{{gap}}ता. २३ डिसेंबर सन १९३३. आज सर्व सकाळभर मी आपल्या इष्ट मित्रांस झालेल्या प्रवासाबद्दल व दक्षिण हिंदुस्थानच्या भावी प्रवासाच्या<noinclude></noinclude> onx4uemcr9krwixlvadw7orqbw0pxm3 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४४ 104 111980 236324 2026-08-29T10:33:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236324 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जाफना अथवा नागद्वीप|१२३ }}</noinclude>कार्यक्रमाविषयीं बरींच पत्रे लिहिलीं व पुढील प्रवासाची सामुग्री- पैसे तारेनें मदुरेस गेल्यावर मिळावे अशाबद्दल तजवीज केली. यामुळे सकाळीं दृश्यदर्शनास जातां आलें नाहीं. पण दोन प्रहरीं आम्ही मोटारमध्यें बसलों व रात्रपर्यंत किती तरी प्रेक्षणीय स्थळें पाहिली. प्रथमतः आम्ही उत्तरेस दहा बारा मैलावर असलेलें '''पॉइंट पालमिरा''' नांवाचें टोंक पहाण्यास गेलों. या भागांत जिकडे तिकडे पालमिरा पामची राई नव्हे, रानच्या रान आहे. पालमिरा पामचें हें रान मोठें मजेदार दिसतें. आम्ही जमीनीच्या टोकाशीं आलों तोंच पोपटीरंगी पाण्याचा व श्वेत- फोनयुक्त लाटांनी डोलायमान होणारा बंगालचा उपसागर आमच्या दृष्टीस पडला! काय तो चित्ताकर्षक देखावा! वंग देशांतील विजयकुमार आपल्या सवंगड्यासकट या बंदराला आला व येथून मग तो पुढें अनुराद्धपुराकडे गेला अशी एक दंतकथा या भागांत प्रचलित आहे. विजयकुमार बंगालच्या उपसागराच्या मार्गानें प्रथम लंकेंत आला किंवा हिंदी महासागराच्या मार्गानें प्रथम लंकेंत आला- कारण दंतकथा दोन्ही तऱ्हेच्या आहेत असें दिसतें- हा शोध करण्यासारखा प्रश्न आहे असें मला वाटलें. पण सध्यां त्या भानगडीत न पडतां आम्ही दंतकथा खरी मानून या केशरीरंगी सुंदर वाळवंटावर थोडा वेळ हिंडलों व बंगालच्या उपसागराच्या लाटांच्या तांडवाचें निरीक्षण केलें. येथून हिंदुस्थानचा किनारा केवळ वीसबावीस मैलच दूर असून हिंदुस्थानच्या आग्नेय (पूर्वदक्षिण) किनाऱ्यावरील '''कॅलिमर''' नांवाचें टोंक या ठिकाणाच्या समोरच आहे; व या टोंकाचे थेट उत्तरेस नागापट्टम् नांवाचें मद्रास इलाख्यांतील बंदर असून तेथून लंकेंतील गॉल बंदरावरून कोलंबो बंदरापर्यंत आगबोटीची रहदारी चालू आहे असें मला सांगण्यांत आलें. सुमारें अर्धा तास या ठिकाणच्या निसर्गरमणीय देखाव्याचा आस्वाद घेऊन आम्ही परत फिरलों व मग समुद्रालगतच्या सडकेनें कंकेसंतुराईवरून जाफना द्वीपकल्पाच्या पश्चिम टोकाला आलों. या बाजूस साहासात बेटें असून तीं जाफना जिल्ह्यांत मोडतात. जाफना<noinclude></noinclude> cspuwx1a2h8mpasba5zfqofumbtnyar पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४५ 104 111981 236325 2026-08-29T10:38:51Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236325 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२४ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>द्वीप कल्पाचें पश्चिम टोक व '''करेटिव्ह''' नांवाचें पहिलें बेट यामध्ये एक मैल अंतर आहे. पण येथें पाण्याचे सपाटीबरोबर बसका पूल व धक्का बांधला आहे. या पुलावरून व धक्यावरून जातांना मला एलिफंट पास या पुलाची आठवण झाली. दोन्ही ठिकाणच्या देखाव्यामध्ये बरेच साम्य आहे. करेटिव्ह हें बेट साधारण चौकोनी पण लहानच आहे. त्याच्या दक्षिणेकडचें लेडन बेट हे लांबच लांब बेट असून तें या द्वीपसमूहामधील सर्वात मोठे बेट आहे. या बेटामध्यें '''काईट्स''' म्हणून मोठा गांव आहे. या द्वीपसमूहाचें हें मुख्य ठाणें आहे व येथें सरोवराचे पाणी खोल असल्यामुळे येथेंच जाफनाचें मोठीं गलबतें येणारें बंदर आहे. '''करेटिव्ह व लेडन''' या बेटांमधील खाडी अर्धा मैल असेल; पण ती बरीच खोल असल्यामुळे या खाडीवर पूल नाहीं; पण तराफ्यावर मोटारी हांकीत नेण्याची सोय केलेली असल्यामुळें व तराफा खाडींतून बिन वल्हवितां दोरीच्या साहाय्यानें पलीकडच्या तीराला नेण्याची मोठ्या युक्तीची तजवीज केली असल्यामुळे फारसा त्रास न पडतां व फाजील वेळ न मोडतां मोटार '''काईट्स''' गांवाला जाऊं शकते. येथील तराफा पैलतीरास नेण्याची युक्ती आपल्या इकडल्या तारेच्या साहाय्याने नदीपार तर नेण्याच्या पद्धतीपेक्षां जरा निराळी आहे. खाडीच्या दोन्ही तीरांस पाण्यांत मोठमोठे लाकडी ओंडे पुरलेले असतात व पाण्याच्या सपाटीच्या किंचित् वर त्या दोन्ही बाजूच्या ओंड्यांना भलें मोठें दोरखंड घट्ट बांधलेलें असतें. तराफ्याच्या दोन्ही टोंकांस दोन कप्या दोनतीन हात उंचीच्या खांबावर बसविलेल्या असतात. तराफा सुरू करावयाचा झाला म्हणजे खाडीचे पाण्यावर असलेलें तें दोरखंड त्या कप्यावर चढविलें जातें. मग खलाशी तें दोरखंड ओढीत तराफ्याच्या या टोंकापासून त्या टोकापर्यंत मोटेच्या बैलाप्रमाणें पुढें मागें जातात. या दोरखंडाला ओढण्याच्या शक्तीनें दोरखंड तर सरकत नाहीं, (कारण तें दोन्ही तीरांच्या ओंड्यांना घट्ट बांधलेलें असतें) पण ती शक्ती तराफ्याला मिळते व तराफा झरझर पुढे सरकतो. ही योजना<noinclude></noinclude> fauyaa4jnelv9rwt2lheb2pc6hklasu पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४६ 104 111982 236326 2026-08-29T10:43:00Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236326 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जाफना अथवा नागद्वीप|१२५ }}</noinclude>मी प्रथम पाहिली तेव्हां मला असा भास झाला की खरोखरी दोरखंड मागे ओढले जात आहे; पण बारकाईनें पाहतां तराफा पुढें जात आहे असें माझ्या ध्यानांत आलें. तराफ्यावरून मोटारबस रस्त्यावर आली तोंच '''काईट्स''' गांवांतील सरकारी इमारती दिसूं लागल्या व बंदरांत मोठमोठी जहाजें नांगरलेली दृष्टीस पडली. येथें थेट रंगूनहून गलबतें तांदूळ घेऊन येतात असें मला कळलें. या बेटावरही जाफना द्वीपकल्पाप्रमाणें नारळी पोफळी केळी यांच्या बागा व भातशेती विपुल आहे. गांवांतून आम्हीं माझ्या नव्या मित्रांच्या एका सहाध्यापकाचे बंगल्यावर गेलों. हा बंगला गांवापासून जरा दूर असून त्याचे सभोंवार जिकडे तिकडे हिरवीगार भाताची शेतेंच शेतें असून बंगल्यांत पुष्कळ नारळीचीं झाडें व बरींच फुलझाडें होती. तेथें थोडा वेळ बसून संध्याकाळ झाली म्हणून आम्ही आल्या तरीनें परत फिरलों. '''लेडनबेट''' बरेंच लांब असून त्याच्या दक्षिण टोकाला व जाफना किल्ल्यासमोर तराफ्यानें पलीकडे जाण्याची सोय आहे. पण त्या ठिकाणीं पैलतीरास जाण्यास जास्त वेळ लागतो; म्हणून आम्ही त्या लांबीच्या रस्त्यानें न जातां पूर्वीच्या तराफ्याच्या रस्त्यानें जाफना द्वीपकल्पांत आलों. तेथून मात्र खाऱ्या सरोवराच्या कांठच्या सडकेनें परत बिऱ्हाडीं आलों. यामुळे सायंकाळच्या सूर्यास्ताचा चित्ताकर्षक देखावा व एकंदर सरोवराचा सुंदर देखावा यांचें पुनर्दर्शन घडलें.
{{gap}}ता. २४ दिजंबर सन १९३३. आज मी सर्व दिवसभर विश्रांति घेतली. कारण दुसरे दिवशीं मी रामेश्वरास जाण्याकरितां निघणार होतों. शिवाय त्या संध्याकाळीं तेथल्या वाङ्मयसभेच्या आश्रयाखाली मी 'ललितकलांचें स्वरूप' या विषयावर सार्वजनिक व्याख्यान देण्याचें कबूल केलें होतें. तेव्हां व्याख्यानविषयासंबंधीं माझे विचार व माझा अनुभव यांची मनांत जुळवाजुळव करण्यास मला सवड पाहिजे होती. मी रहात होतों तेथल्या दिवाणखान्यांत माझें व्याख्यान होतें. व्याख्यानाला गांवांतील सुशिक्षित मंडळी जमली होती. व्याख्यानाचे शेवटीं नव्या मंडळींशीं माझा परिचय करून देण्यांत आला. त्यांत एक बाहेर<noinclude></noinclude> djunv7bvdtcqu66ttxqvdvzb3v03u5t पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४७ 104 111983 236327 2026-08-29T10:45:13Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236327 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>गांवचे पेन्शनर गृहस्थ होते. हे गृहस्थ एका जुन्या प्रेक्षणीय देवळाचा जीर्णोद्धार करीत होते; व दुसरे दिवशीं दोन प्रहरीं ते स्वतंत्र मोटारनें त्या ठिकाणी जावयाचे होते. माझी प्रवासप्रियता व दृश्यदर्शनाची आवड पाहून ते मला म्हणाले "उद्यां दोनप्रहरीं माझ्या बरोबर मोटारीमध्ये आपण यावें व जीर्णोद्धार होत असलेलें देवालय पाहावें; तें पाहिल्यावर रात्रींच्या गाडीच्या वेळेवर मी आपल्यास '''मनकूलम्''' स्टेशनला पोहोंचतें करण्याची तजवीज करीन; म्हणजे जाफनाहून सायंकाळी सात वाजतां निघणारी गाडी आपल्याला गांठतां येईल व ता. २६ दिजंबर रोजी सकाळीं साहा वाजतां आपल्याला तलाईमानारला पोहोंचतां येऊन आगबोटीनें धनुष्कोडीस व पुढें रामेश्वरास जातां येईल." ता. २५ रोजी सायंकाळी सात वाजतां जाफनाहून आगगाडीनें जाणें काय किंवा दोन प्रहरी दोन वाजतां मोटारीनें निघून तीच आगगाडी / मधल्या एका स्टेशनवर गांठणें काय मला सारखेंच असल्यामुळे मी त्या गृहस्थाच्या म्हणण्याला ताबडतोब रुकार दिला. दोन प्रहरी मोटारकार घेऊन येतों असें सांगून त्या गृहस्थानें माझा निरोप घेतला.
{{gap}}ता. २५ डिसेंबर सन १९३३. आज माझ्या जाफना निवासाचा शेवटचा दिवस होता. तेव्हां मी माझ्या सामानांची बांधाबांध केली व नव्या मित्रांचा निरोप घेतला. या नव्या मित्रांत जाफनाच्या हिंदु ऑर्गन नांवाच्या इंग्रजी द्विसाप्ताहिक वर्तमानपत्राचे एक सहसंपादक होते. त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेच्या माहितीबद्दल माझी मुलाखत घेतली. ती त्यांना मीं लिहून दिली. शिवाय, त्यांनीं आपल्या इंग्रजी पत्रांत 'लंकेबद्दल माझे ग्रह' (My impression of Ceylon) नांवानें कांहीं लेख लिहावे अशी मला आग्रहाची विनंति केली व मलाही त्यांना नकार देववेना; म्हणून मी ती गोष्ट कबूल केली. दोन प्रहरीं अडीच वाजतां आदल्या दिवशीं ठरल्याप्रमाणें ते गृहस्थ मोटार घेऊन आले. मी मुडलीयार साहेब, स्वामीजी व इतर तेथें असलेल्या मित्र मंडळींचा निरोप घेऊन मार्गस्थ झालों. पण आम्हीं गांव टाकून मैलभर<noinclude></noinclude> ofsfmyva8l24svmk50drnpwplw1ogxx पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४८ 104 111984 236328 2026-08-29T10:47:44Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236328 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||जाफना अथवा नागद्वीप|१२७ }}</noinclude>आलों नाहीं तोंच आमच्या मोटारने त्रास देण्यास सुरवात केली; मोटार चालतां चालतां मध्येच थांबे; ड्रायव्हरनें दुरुस्ती करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला; पण मोटार पांच पन्नास यार्ड चालावी व पुनः बंद पडावी असा क्रम सुरू झाला. रात्रीची आगगाडी चुकणार की काय अशी मला धागधुग वाटूं लागली. माझ्या बरोबरच्या गृहस्थासही तीच धास्ती वाटत असावी असें दिसलें. अशा मनाच्या अधीर व अस्वस्थ स्थितींत दोन तास गेले व सायंकाळ होत चालली. तेव्हां हमालाच्या डोक्यावर सामान देऊन जाफना स्टेशनला चालत जाणें जरूर आहे असें मी त्या गृहस्थास सांगितलें. त्यांनाही केलेला बेत फसल्यामुळे वाईट वाटलें. पण तेथें हमाल तरी कसा मिळणार? एक दोघांना विचारतां ते जाण्यास तयार होईनात. पण इतक्यांत मोटार दुरुस्त झाली. पण आतां चाळीस मैल मोटारीनें प्रवास करून '''मनकूलम''' स्टेशन वेळेवर गांठणे शक्य नाहीं असें पाहून आम्हीं मोटारं मागें फिरवून जाफना स्टेशनला आलों.
{{gap}}प्रेक्षणीय स्थळ पाहण्याचा बेत फसला म्हणून माझा हिरमोड झाला. त्या गृहस्थाला तर अधिक वाईट वाटलें. पण "अर्वाचीन यांत्रिक प्रवास- साधनामध्ये केव्हां केव्हां असा बिघाड होऊन बेत बिघडावयाचाच. त्याला इलाज नाहीं; तेव्हां वाईट वाटून घेण्याचे कारण नाहीं." असे म्हणून मी त्या गृहस्थाचे आभार मानले व मग ते गृहस्थ परत शहरांत गेले व मी स्टेशन मधील '''वाटपाही''' खोलींत बसलों. लवकरच आगगाडी प्लॅटफार्मवर आली व मी आगगाडींत सेकंड क्लासच्या डब्यांत जाऊन बसलों. डब्यांत गर्दी नव्हती. साडेसातला आगगाडी चालू झाली. मी '''मडवाची''' स्टेशनला रात्री बाराच्या सुमारास आलों. आजची नाताळची रात्र असल्यामुळे स्टेशनांतील सर्व एंजिनांना फुलांच्या व पानांच्या माळा घातल्या होत्या व बारा वाजतां त्यांनी शिट्याही फुंकल्या. अनुराद्धपुरास मी परतीचें तिकीट घेतलें होतें. त्यामुळे जाफनापासून मडवाचीपर्यंत माझें तिकीट होतेच.<noinclude></noinclude> d1zg10jskqci32m2lp7w2w7o3dl4c8p पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१४९ 104 111985 236329 2026-08-29T10:52:07Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236329 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१२८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>तेव्हां बारा वाजल्यानंतर मी '''मडवाची ते धनुष्कोडीचें''' सेकंड क्लासचें एकेरी तिकीट घेतलें. कारण, लंकेला परत जातांना '''ट्युटिकोरिन''' या बंदरापासून कोलंबोला बोटीनें प्रवास करावयाचा माझा बेत होता. मडवाचीपासून धनुष्कोडी स्टेशनपर्यंत आगबोटीच्या भाड्यासकट भाडें साहा रुपये व साठ सेंट पडलें. रात्री एकाच्या सुमारास तलाईमानारकडे जाणारी आगगाडी आली व मग आमचे डबे त्या आगगाडीला जोडण्यांत आले व आगगाडी चालू झाली. डब्यांत रात्रींसुद्धां फारशी गर्दी नव्हती म्हणून मी बाकावर आडवा झालों खरा. पण ऊष्मा पुष्कळ होत असल्यामुळे मला चांगली झोप आली नाहीं. पहाटेस पावणेसहा वाजतां आमची आगगाडी तलाईमानारच्या धक्क्यावर आली; धक्क्याला आगबोट लागलेली होती. यामुळे एका आगगाडींतून प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूस असलेल्या आगगाडींत बसावें त्याप्रमाणें आगगाडीतून आगबोटीत ताबडतोब बसतां आलें. झालें. अर्ध्या पाऊण तासानें आगबोट चालू झाली व 'पुनरागमनायच' असें म्हणून लंका बेटाचा मी मनांतल्या मनांत निरोप घेतला. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणें दक्षिण हिंदुस्थान व विशेषतः केरल प्रांत येथील तीन आठवड्यांचा प्रवास करून मला लंकेला परत यावयाचें होतें. याप्रमाणे माझा लंकेच्या उत्तरेकडचा व जाफना द्वीपकल्पाचा प्रवास पुरा होऊन मीं तात्पुरतें लंका बेट सोडून हिंदुस्थानास परत आलों.

{{rule|5em}}{{rule|7em}}{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> 3sfhlsu6amoz4oqeuimge7vf4nbeam3 पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५० 104 111986 236331 2026-08-29T11:00:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 236331 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ९ वें'''}}}} {{rule|7em}} {{center|{{x-larger|'''श्रीपाद शिखर'''}}}} {{rule|5em}}
{{gap}}{{x-larger|'''ज'''}}'''री''' या खेपेचा माझा प्रवास बरोबर तीन महिन्यांचा म्हणजे ता. २२ नवंबर सन १९३३ ते २१ फेब्रुवारी सन १९३४ पर्यंतचा झाला, तरी माझा लंकेचा निवास व पर्यटन दोन महिनेच झाले व तें दोन हप्त्यांनीं झालें. ता. २४ नवंबर ते २५ दिजंबर सन १९३३ हा पहिला हप्ता व ता. १७ जानेवारी ते १९ फेब्रुवारी सन १९३४ हा दुसरा हप्ता. लंकेचें माझें पहिलें दृश्यदर्शन ता. २५ दिजंबर सन १९३३ रोजी संपलें. महाराष्ट्रांतील एका विख्यात विभूतीच्या आयुष्यांतील एका विलक्षण प्रसंगानंतर त्यांनीं आपला नित्य व्यवसाय पुनः सुरू केला तेव्हां म्हटलेला व म्हणून सर्वतोमुखी झालेला मन्त्र ''''पुनश्चहरिः ओम्'''' हा म्हणून मी आपल्या लंकेच्या दुसऱ्या हप्त्याच्या दृश्यदर्शनास सुरवात ता. २८ जानेवारी १९३४ रोजी केली. लंकेतील प्रेक्षणीय स्थळांचा मुकुटमणी म्हणजे श्रीपादशिखर (ज्याला इंग्रजीत ॲडॅम्स पीक असें नांव दिलेलें आहे) हे होय. तेव्हां या मुकुटमण्याचें वर्णन माझ्या लंका वर्णनाच्या मधोमध यावें हें योग्यच झाले.
{{gap}}या शिखरास जाण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला कोलंबोच्या '''आग्नेय दिशेस''' ६४ मैलांवर असलेल्या, रत्नाकरितां प्रसिद्ध असलेल्या व म्हणून अन्वर्थक नांवाच्या '''रत्नपूर''' गांवाकडून शिखरावर पाऊलवाटेने चढणें हा होय. या मार्गानें सबंध शिखराचा म्हणजे सुमारें सात सवा सात हजार फुटांचा चढ पायीं चढावा लागतो. कारण रत्नपुर हे गांव साधारणतः समुद्रसपाटीवरच आहे. या जास्त बिकट व दुर्गम मार्गानें शिखर चढल्यास अधिक पुण्यप्राप्ति होते असें भाविक बुद्ध लोक मान-<noinclude></noinclude> ai0nbrejo1ttzbs323wnaqrqgikjv85