विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.17
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf
106
74682
236349
236307
2026-08-29T16:59:49Z
कल्पनाशक्ती
3813
236349
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

27aqn6cf6qc9zkjrpr1lbywhnci1osg
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१११
104
77637
236350
202536
2026-08-29T17:02:13Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236350
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर}}}}
{{center|{{x-larger|'सचोटी, चिकाटी व हातोटी यांचा त्रिवेणी संगम'}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}रविवार, १ फेब्रुवारी १९४८ ची सकाळ. गांधीहत्येनंतर सांगली गावात सर्वत्र दंगल उसळली होती. मालमत्तेची होळी पेटली होती. कैफ चढलेली टोळकीच्या टोळकी रस्त्याने विध्वंसक कृत्ये करत, अर्वाच्य शिविगाळ करत हिंडत होती. श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला सर्व पुजाऱ्यांची घरे पेटवण्यात आली होती; सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर याना धरुन त्यांचे हातपाय तोडल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. भयानक बातम्यांवर बातम्या कानांवर पडून सगळीकडे घबराट पसरली होती. कायदा आणि राजसत्ता लुळी पडल्याचे जाणवत होते; पोलिसफाटा असहाय्य दिसत होता. अशावेळी स्वतःच्या अिच्छेविरूद्ध, नातलगांच्या आग्रहापोटी, केवळ एका सदऱ्यावर घराबाहेर पडावे लागलेली, साठी अलटूनहि ताठ दिसणारी अेक व्यक्ती, सांगली-मिरज रस्त्यावरील राजेसाहेबांच्या गेस्ट हाऊसच्या गच्चीवर अभे राहून हताशपणे सांगलीच्या दिशेने पहात होती. अंगाची आग आग होत होती. नाडीचे ठोके जोरात पडत होते. नाका तोंडातून कढत श्वास बाहेर पडत होते. सतत चाळीस वर्षे खपून, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन अभी केलेली अुद्योगवास्तू आगीच्या, मुद्दाम लावलेल्या, आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होती. सुताच्या गाठी, रंगीत सुताचे गुदाम, रंगशाळा, कापड-गाठी, मोटारी, गॅरेज सर्व काही जळत होते. क्रूड ऑईलचे हौद पेटले. बेछूट जमाव दिसेल ते पेटवीत होता. श्रीकृपा बंगला, कापसाचे गोदाम, अभ्यागतगृह जळत होते. पेटवायला कंपौअंडमध्ये पडलेली जळाऊ लाकडे आयतीच दंगलखोरांच्या कामी आली होती.

{{gap}}कधी न खचणारी पण त्या जीवघेण्या क्षणी विमनस्क झालेली व्यक्ति म्हणजे सांगलीचे अुद्योगपती कै. अुद्योगरत्न वि. रा. तथा दादासाहेब वेलणकर आणि आगीच्या ज्वाळात, निष्पाप सतीसारखी जळत असलेली ती वास्तू म्हणजे श्रीगजाननमिलची इमारत.

{{gap}}नियती साप-शिडीचा पट कसा मांडून ठेवते पहा.

{{gap}}अवघ्या १३ महिन्यापूर्वी म्हणजे १९ जानेवारी १९४७ ला दादासाहेब वैभवशिखरावर होते; दैवदुर्लभ अशी सुवर्णतुला थाटामाटात पार पडली होती; दृष्ट लागण्यासारखा सोहळा होता तो. आणि दुर्दैवाने केवळ वर्षभरात खरोखर दृष्ट लागली!<noinclude>सांगली आणि सांगलीकर....................८७</noinclude>
ssfv9ef74g6r2zgrz9oisrtf0goa8no
236351
236350
2026-08-29T17:02:42Z
कल्पनाशक्ती
3813
236351
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{xx-larger|अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर}}}}
{{center|{{x-larger|'सचोटी, चिकाटी व हातोटी यांचा त्रिवेणी संगम'}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}रविवार, १ फेब्रुवारी १९४८ ची सकाळ. गांधीहत्येनंतर सांगली गावात सर्वत्र दंगल उसळली होती. मालमत्तेची होळी पेटली होती. कैफ चढलेली टोळकीच्या टोळकी रस्त्याने विध्वंसक कृत्ये करत, अर्वाच्य शिविगाळ करत हिंडत होती. श्रीक्षेत्र नृसिंहवाडीला सर्व पुजाऱ्यांची घरे पेटवण्यात आली होती; सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते भालजी पेंढारकर याना धरुन त्यांचे हातपाय तोडल्याची अफवा सर्वत्र पसरली होती. भयानक बातम्यांवर बातम्या कानांवर पडून सगळीकडे घबराट पसरली होती. कायदा आणि राजसत्ता लुळी पडल्याचे जाणवत होते; पोलिसफाटा असहाय्य दिसत होता. अशावेळी स्वतःच्या अिच्छेविरूद्ध, नातलगांच्या आग्रहापोटी, केवळ एका सदऱ्यावर घराबाहेर पडावे लागलेली, साठी अलटूनहि ताठ दिसणारी अेक व्यक्ती, सांगली-मिरज रस्त्यावरील राजेसाहेबांच्या गेस्ट हाऊसच्या गच्चीवर अभे राहून हताशपणे सांगलीच्या दिशेने पहात होती. अंगाची आग आग होत होती. नाडीचे ठोके जोरात पडत होते. नाका तोंडातून कढत श्वास बाहेर पडत होते. सतत चाळीस वर्षे खपून, प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन अभी केलेली अुद्योगवास्तू आगीच्या, मुद्दाम लावलेल्या, आगीच्या भक्ष्यस्थानी पडत होती. सुताच्या गाठी, रंगीत सुताचे गुदाम, रंगशाळा, कापड-गाठी, मोटारी, गॅरेज सर्व काही जळत होते. क्रूड ऑईलचे हौद पेटले. बेछूट जमाव दिसेल ते पेटवीत होता. श्रीकृपा बंगला, कापसाचे गोदाम, अभ्यागतगृह जळत होते. पेटवायला कंपौअंडमध्ये पडलेली जळाऊ लाकडे आयतीच दंगलखोरांच्या कामी आली होती.

{{gap}}कधी न खचणारी पण त्या जीवघेण्या क्षणी विमनस्क झालेली व्यक्ति म्हणजे सांगलीचे अुद्योगपती कै. अुद्योगरत्न वि. रा. तथा दादासाहेब वेलणकर आणि आगीच्या ज्वाळात, निष्पाप सतीसारखी जळत असलेली ती वास्तू म्हणजे श्रीगजाननमिलची इमारत.

{{gap}}नियती साप-शिडीचा पट कसा मांडून ठेवते पहा.

{{gap}}अवघ्या १३ महिन्यापूर्वी म्हणजे १९ जानेवारी १९४७ ला दादासाहेब वैभवशिखरावर होते; दैवदुर्लभ अशी सुवर्णतुला थाटामाटात पार पडली होती; दृष्ट लागण्यासारखा सोहळा होता तो. आणि दुर्दैवाने केवळ वर्षभरात खरोखर दृष्ट लागली!<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................८७</noinclude>
8xwd6kr7wot8vh90eppgtzjkf9t0n71
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११२
104
77638
236352
202537
2026-08-29T17:14:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236352
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>श्रीगजाननमिल जळून खाक झाली. शरमेची बाब म्हणजे हे सगळं मानव-निर्मित होतं. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाच्या विषारी प्रचारापोटी प्रक्षोभक गुंडांनी घातलेला तो नंगा नाच होता.

{{gap}}सर्व स्थिरस्थावर झालं. लष्कराची मदत आली. दादासाहेबानी आपल्या सहकाऱ्यांसोबत दुसरे दिवशी जळलेली वास्तू बघितली. कारखान्याच्या आवारात सगळीकडे काळाच काळा रंग दिसत होता. बागेतील लहान लहान फुलझाडेच काय पण शंभर फुटांवरील झाडेही करपून गेली होती. घरावरील उंच पत्रे, कारखान्यावरील पत्रे भाजलेल्या पापडासारखे वाकडे-तिकडे झाले होते. मोठमोठे लोखंडी बीम पार वाकून मराठी 'ळ' इंग्रजी 'S' आकड्यासारखे वळलेले होते.

{{gap}}खरं म्हणजे दातखीळ बसावी, पाहताक्षणीच वेडाचा झटका यावा, नैराश्यापोटी जीव द्यावा असं वाटायला लावणारी ती परिस्थिती होती. पण खऱ्या सोन्याची कसोटी अग्निसमोरच लागते! एका अदृश्य शक्तीने दादासाहेबांच्या देहात प्रवेश केला. समोर सुंदर ८०० ग्रंथ, वेदांताची टिपणे, गीतारहस्याचे टिपलेले सार जळून पडले होते; पण भगवत्गीतेचे चिंतन मनात सजग होते....."अश्नुते स हि कल्याणं व्यसने यो न मुह्यति ।"

{{gap}}फिनिक्स पक्ष्याने राखेतून भरारी मारावी तशी किमया दादासाहेबानी केली. सगळी मरगळ झटकून टाकली. त्यांनी आणि सहकाऱ्यांनी कंबर कसली. अविरत श्रम सुरू झाले. जिद्दीने नित्य कामे सुरू झाली. श्रीगजाननमिल्सची कीर्तिध्वजा त्यांच्या आवडत्या टॉवरसारखी उंचावू लागली. सुवर्णतुला झालेले दादासाहेब, या अग्निपरीक्षेतून आणखीनच झळाळून निघाले.

{{gap}}दादासाहेबांचे सगळे आयुष्य मुळी कसोट्या देण्यातच गेले. त्या दृष्टीने त्यांचा वैशिष्ट्यपूर्ण जीवनपटच अलगडून पहायला हवा. चार आणे मजुरीवर काम करणाऱ्या सामान्य माणसाने, शेकडो कामगारांना भाकरी देणारा कारखानदार व्हावं, हा काही दैवी चमत्कार नव्हता तर यत्नदेवतेची ती अहर्निश पूजा होती. त्या पूजेचे फळ होते.

{{gap}}दादासाहेबांचा जन्म ६ जानेवारी १८८७ रोजी वेलणकर कुटुंबातील रामचंद्रपंत वेलणकर यांच्या कुटुंबात झाला. एकूण नऊ मुलांपैकी ते आठवे अपत्य. मूळ नाव विष्णू. साताऱ्याच्या उत्तरेस कृष्णा नदीच्या तीरावर असलेल्या 'कसबे लिंब' या गावात त्यांचे बालपण गेले. मराठी सातवीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. लहानपणी विष्णुपंत अगदी कृश होते. शाळेतील बिगरब्राह्मण मुलं जाता-येता, “जयदेव जयदेव, जय बामण भट्टा". अशी हात ओवाळून आरती केल्यासारखी त्यांची कुचेष्टा करीत तेव्हा त्याना आपल्या शारीरिक दौर्बल्याची जाणीव झाली. एकसारख्या भांडाभांडी,<noinclude>सांगली आणि सांगलीकर.............................८८</noinclude>
ddtk2gbrite4bb7r8j4xjswfn73lm9g
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११३
104
77639
236353
202538
2026-08-29T17:20:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236353
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>मारामाऱ्या होत. मग चिडवणाऱ्या मुलांपैकी मोठा मुलगा म्हणायचा "नुसती तक्रार, मारामारी नको. कुस्ती मारून न्याव (म्हणजे न्याय) करा.” कुस्त्या लागल्या की ब्राह्मणांची मुले धडाधड पडायची! हुर्यो व्हायची. ही गोष्ट इतरांच्या नाही पण विष्णुपंतांच्या मनाला फार लागली. तेव्हा दृढनिश्चयाने तालमीत जाऊन त्यानी व्यायामाला सुरुवात केली. दिवसें दिवस मेहनत केली. छोट्या मोठ्या कुस्त्या मारल्या तेव्हापासून ती बिगरब्राह्मण मुलं पण त्याना मान देऊ लागली. एकंदरीत तो जातीपातीचा झगडा नव्हता ही गोष्ट विष्णुपंतांच्या लक्षात आली. व्यायामाचे माहात्म्य मात्र त्यानी तेव्हापासून जाणले. बलवान माणसाकडे कुणी डोळा वाकडा करुन बघू शकत नाही हे सत्य त्यांच्या लहानपणापासूनच मनावर ठसले. त्यामुळे शरीराची जोपासना त्यांनी आयुष्यभर एखादे खडतर व्रत अंगिकारावे तशी केली. शरीर सदैव स्वतःच्या 'स्वाधीन' ठेवले. ही शरीरसाधना अखेरपर्यंत त्याना अपयोगी पडली. कारखान्यात सदैव तासन् न तास खडतर काम करताना वृध्दापकाळातही त्याना कधी थकवा असा जाणवला नाही.

{{gap}}इंग्रजी ५ वीपर्यंतचे त्यांचे शिक्षण साताऱ्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. पण शिक्षणाकडे त्यांचे फारसे लक्ष नसायचे. तालमीत घुमणे आवडायचे. वॉचमेकर, कारागीर यांच्याकडच्या यंत्रांबरोबर मात्र खेळत राहायला त्याना मनापासून आवडे. ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, घरच्या मंडळीनी त्यांना धंदेशिक्षणासाठी पाठवायचे ठरविले. विष्णुपंतानी शाळेला रामराम ठोकला. त्यांच्या मित्राना वाटले म्हणजे याला आता आयुष्यात नोकरी मिळणे कठीण! "अरेरे, आता तो बिचारा घिसाडी, सुतार किंवा कोष्टी होणार. वाईट झालं" त्या सुमारास 'केसरी' मध्ये बडोद्याच्या कला भुवनाची जाहिरात आली होती. त्या संस्थेत रंगशाळा, रसायनशाळा, शिल्पशाळा, चित्रशाळा असे धंदेशिक्षण देणारे विविध विभाग होते. विष्णुपंतानी बडोद्याला विणकामशाखेत प्रवेश घेतला. लहान वय, बडोद्यास घरच्या मंडळींपासून दूर एकटं राहायचं, शिक्षण कसं जमेल, अशा अनेक प्रकारच्या शंका मनात डोकावत होत्या; नववधूच्या मनात सासरी जाताना असतात तशा. पण विष्णुपंत हिय्या करुन गेले. ज्या ज्ञानावर भविष्यकाळात त्यानी मोठ्या कारखान्याचा इमला रचला त्या विणकामाचे प्राथमिक शिक्षण त्याना बडोद्यात मिळाले. विणकामासंबंधी शास्त्रीय माहिती मिळाली. प्रात्यक्षिके करायला मिळाली. गाठ कशी मारावी, तार कशी घ्यावी हे शिकून त्यांनी कोष्ट्याच्या घरी असतो तशा दोन धावत्या धोट्यांच्या मागांवर लंगोटीएवढे रुंद कापड काढत काढत टुवाल, किनारीतील रुईफुले, गोमी, करवती किनारी वगैरे नमुने मागावर काढण्याइतकी प्रगती केली. त्याचबरोबर दुर्बिणीतून नमुना कसा पहावा, त्यावरुन गणना करुन तत्सम नमुना कसा काढावा, हिशोब कसा करावा याचे पण ज्ञान घेतले.<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...............................८९</noinclude>
laso96005pm6rxvodyogjieltv2hm1f
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११४
104
77640
236354
202539
2026-08-29T17:23:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236354
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वास्तविक बडोद्याचा शिक्षणक्रम तीन वर्षाचा होता. पण तेथे फार मोठी यंत्रसामुग्री नव्हती; शिकायचे ते वर्षभरातच शिकून झाले. अगाच घरच्यांच्या पैशाचा का अपव्यय करा अशा विचाराने ते आपल्या लिंब गावी परतले: थोड्या खिन्न मनानेच कारण घरच्या घरी हातमाग घालणे, सुताचा ताणा करणे, खळ देणे व अशा तऱ्हेने स्वतंत्रपणे कारखाना चालविणे, याबाबतीत फारसे शिकायला मिळाले नव्हते. अशा बेचैनीत असतानाच त्याना कोलकत्त्याच्या विणकाम शाळेचा पत्ता लागला. तेथे सुतापासून कापड तयार होईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया शिकवल्या जातात असे कळल्यावर, घरच्यांच्या संमतीने आणि वडील बंधूंच्या आर्थिक पाठबळावर त्यानी कोलकत्ता गाठले. पण तेथेही कारखाना अभा करायला अुपयोगी पडेल असे शिक्षण मिळणे कठीण दिसले तेव्हा वर्षभरातच ते गावी परतले. मग काही दिवस बेळगाव, रायबाग येथे चालणाऱ्या दोन-तीन कारखान्यांतून त्यानी प्रत्यक्ष जाऊन शिक्षण घेतले.

{{gap}}त्या सुमारास लो. टिळकानी 'केसरी' मधून स्वदेशीचा पुरस्कार करताना महाराष्ट्रीय तरुणांनी स्वतंत्र अुद्योगधंदे निर्माण करावेत असे आवाहन केले होते. त्यावेळी त्यानी परदेशी मालाची हकालपट्टी करण्यासाठी, तसल्या वस्तू निर्माण करणारे कारखाने येथे स्थापन झाले पाहिजेत असे आग्रहाने सांगितले होते. विष्णुपंत मोठे टिळकभक्त आणि स्वदेशाभिमानी होते. तेव्हा आपण एखादा स्वतंत्र अुद्योग सुरु करावा अशी त्यांची जिद्द होती. १९०८ साली आपल्या लिंब गावीच दोन माग घालून विष्णुपंतानी कारखाना चालू केला. तो दिवस होता श्री गणेश चतुर्थीचा, म्हणून कारखान्याला नाव दिले श्रीगजाननमिल. दोन्ही माग बेळगाव- रायबागचे होते. एक जपानी पध्दतीचा तर दुसरा धावत्या धोट्याचा. विष्णुपंत स्वतः मागावर बसत. अुकलाव करावा, ताणा करावा, वई-फणी करावी, कांडी भरावी अशी सगळी कामे ते स्वतःच करत. रोज १० तास मेहेनतीचे काम होई. गावातील लोक कौतुकाने बघायला येत. अुत्साहाच्या भरात जो जे म्हणे तसले कापड-वस्त्र विष्णुपंत काढत. पंचे, कोटाचे कापड, कुणबाऊ धोतरजोडे, अंग पुसण्याचे टॉवेल वगैरे वगैरे. यात त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन होई; पण या प्रकारात नाना प्रकारचे सूत शिल्लक राही आणि त्यात भांडवल अडकून पडे. या प्रकारामुळे अुद्योग गुंडाळण्याचीच नामुष्की पदरी आली. पण तेवढ्यात प्लेगची साथ आली. घर बंद करून दूर माळावर राहायला गेल्यावर आपोआपच माग बंद पडले. एकाच जातीचे कापड (पंचे तर पंचे, धोती तर धोतीच) काढले असते तर सुताचा वापर सुयोग्य तऱ्हेने झाला असता एवढे महत्त्वाचे व्यवहारज्ञान या खटाटोपातून झाले हेही नसे थोडके!{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.....................................९०</noinclude>
rm5r8bwm56z6d09ex2rvhwkn7f2te5d
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११५
104
77641
236355
202540
2026-08-30T08:08:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236355
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}मध्यंतरीच्या काळात घरच्या मंडळीनी विष्णुपंतांच्या अिच्छेविरुध्द त्यांचे लग्न लावून दिले. त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे. म्हणजे आता एकाच्या ऐवजी दोन परावलंबी जीव! पोटाला काही तरी मिळवायला हवं म्हणून ते सोलापूरच्या कापड गिरणीत 'बॉबिन बॉय' म्हणून नोकरीला राहिले. नोकरी करता करता फावल्या वेळात ते यंत्रमागाचे शिक्षण घेत. कारण एकूण अनुभवावरुन, आता हातमागावर काम न करता यंत्रमागावरच करायचे असे त्यानी निश्चित केले होते.
{{gap}}एका बाजूला सोलापूरच्या शेकडो मागांच्या गिरण्या आणि दुसऱ्या बाजूला कोष्ट्याचा पारंपारिक हातमाग, यांच्यामधला सुवर्णमध्य नाही का साधता येणार? याचा विष्णुपंत गांभीर्याने विचार करु लागले. शोध घेता घेता रु. ७००० - ७५०० भांडवल गुंतवून तीन यांत्रिक माग घातले तर होणारा अत्पादनखर्च, घसारा, प्रत्यक्ष विक्री, असा आराखडाच कागदावर मांडून खोलवर विचार केल्यावर त्याना अचानक जाणवले की बरोबर साडेतीन वर्षांत भांडवलाइतका नफा मिळू शकतो! मग ते सर्वाना आपला प्लॅन दाखवत सुटले. तज्ञांचे म्हणणे की ताणा पाजणीचे काम कसे करणार? शंभर मागांना पुरणारे ताणा पाजणीचे यंत्र, केवळ तीन मागांसाठी कसे काय फायदेशीर ठरणार? विचार करता करता विष्णुपंतांच्या डोक्यात लाकडी बीम तयार करण्याची कल्पना आली. छोट्या छोट्या कारखान्याला ताणा पुरविणारी जी विलायती यंत्रे होती त्यांची ताण्याची वळकटी (ड्रम) ४८ ते ६० इंच व्यासाची होती. त्यावर ताणा करुन तो ताणा मागाच्या लोखंडी बीमावर घेण्याची पध्दत होती. मग विष्णुपंतानी त्यावर कल्पना लढवून ताण्याचे बीमच इतके लहान केले की ताण्याची व मागाची वळकटी एकच; त्यावर ताणा भरला की वईफणी करुन ती सरळ मागावर ठेवून कापड काढता यावे. त्यामुळे एक प्रोसेस वाचते. याच कल्पनेने दोन हातमागाचे पुढे तीन यांत्रिक माग झाले; (नंतर १६६ झाले तरी त्यानी याच लाकडी (बीमने) वळकटीने गजानन मिलमध्ये काम केले) याच सुमारास भांडवलाचा प्रश्न सुटला. म्हणजे विष्णुपंताचे श्वशूर श्री. भाऊराव अभ्यंकर यानी सोडवला. त्यानी आपल्या क्रेडिटवर त्यांचे सावकार श्री. भट यांचेमार्फत विष्णुपंताना भांडवलासाठी कर्ज मिळवून दिले. बंद पडलेला कारखाना, आता पुण्याला शेतकी कॉलेजनजीकच्या भट सावकारांच्या बंगल्याच्या कोपऱ्यात सुरू झाला. वास्तविक विष्णुपंतांना ही जागा पसंत नव्हती; कारण रेल्वे स्टेशन, मजुरांची वस्ती, मालविक्रीचे ठिकाण या सर्व महत्त्वाच्या बाबींपासून दूर अंतरावरची ही जागा गैरसोयीची होती. कारखान्याच्या अर्थकारणाला मारक होती. पण भांडवल मिळतेय आणि त्यामुळे कारखाना सुरु करता येतोय या एकमेव आनंदापोटी विष्णुपंतानी हा अपव्याप केला. परिणाम अर्थातच कारखाना नुकसानीत जाण्यात झाला. पुढे, 'भट सावकारांचे पैसे परत करा. माझी भागीदारी काढून घ्या' असा त्यांच्या श्वशुरांचा- अभ्यंकरांचा, तगादा मागे लागला.<noinclude>सांगली आणि सांगलीकर..................................९१</noinclude>
oqynn9cbtf18qgvezzprg2wzj4aln33
236356
236355
2026-08-30T08:08:53Z
कल्पनाशक्ती
3813
236356
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}मध्यंतरीच्या काळात घरच्या मंडळीनी विष्णुपंतांच्या अिच्छेविरुध्द त्यांचे लग्न लावून दिले. त्याकाळच्या रिवाजाप्रमाणे. म्हणजे आता एकाच्या ऐवजी दोन परावलंबी जीव! पोटाला काही तरी मिळवायला हवं म्हणून ते सोलापूरच्या कापड गिरणीत 'बॉबिन बॉय' म्हणून नोकरीला राहिले. नोकरी करता करता फावल्या वेळात ते यंत्रमागाचे शिक्षण घेत. कारण एकूण अनुभवावरुन, आता हातमागावर काम न करता यंत्रमागावरच करायचे असे त्यानी निश्चित केले होते.
{{gap}}एका बाजूला सोलापूरच्या शेकडो मागांच्या गिरण्या आणि दुसऱ्या बाजूला कोष्ट्याचा पारंपारिक हातमाग, यांच्यामधला सुवर्णमध्य नाही का साधता येणार? याचा विष्णुपंत गांभीर्याने विचार करु लागले. शोध घेता घेता रु. ७००० - ७५०० भांडवल गुंतवून तीन यांत्रिक माग घातले तर होणारा अत्पादनखर्च, घसारा, प्रत्यक्ष विक्री, असा आराखडाच कागदावर मांडून खोलवर विचार केल्यावर त्याना अचानक जाणवले की बरोबर साडेतीन वर्षांत भांडवलाइतका नफा मिळू शकतो! मग ते सर्वाना आपला प्लॅन दाखवत सुटले. तज्ञांचे म्हणणे की ताणा पाजणीचे काम कसे करणार? शंभर मागांना पुरणारे ताणा पाजणीचे यंत्र, केवळ तीन मागांसाठी कसे काय फायदेशीर ठरणार? विचार करता करता विष्णुपंतांच्या डोक्यात लाकडी बीम तयार करण्याची कल्पना आली. छोट्या छोट्या कारखान्याला ताणा पुरविणारी जी विलायती यंत्रे होती त्यांची ताण्याची वळकटी (ड्रम) ४८ ते ६० इंच व्यासाची होती. त्यावर ताणा करुन तो ताणा मागाच्या लोखंडी बीमावर घेण्याची पध्दत होती. मग विष्णुपंतानी त्यावर कल्पना लढवून ताण्याचे बीमच इतके लहान केले की ताण्याची व मागाची वळकटी एकच; त्यावर ताणा भरला की वईफणी करुन ती सरळ मागावर ठेवून कापड काढता यावे. त्यामुळे एक प्रोसेस वाचते. याच कल्पनेने दोन हातमागाचे पुढे तीन यांत्रिक माग झाले; (नंतर १६६ झाले तरी त्यानी याच लाकडी (बीमने) वळकटीने गजानन मिलमध्ये काम केले) याच सुमारास भांडवलाचा प्रश्न सुटला. म्हणजे विष्णुपंताचे श्वशूर श्री. भाऊराव अभ्यंकर यानी सोडवला. त्यानी आपल्या क्रेडिटवर त्यांचे सावकार श्री. भट यांचेमार्फत विष्णुपंताना भांडवलासाठी कर्ज मिळवून दिले. बंद पडलेला कारखाना, आता पुण्याला शेतकी कॉलेजनजीकच्या भट सावकारांच्या बंगल्याच्या कोपऱ्यात सुरू झाला. वास्तविक विष्णुपंतांना ही जागा पसंत नव्हती; कारण रेल्वे स्टेशन, मजुरांची वस्ती, मालविक्रीचे ठिकाण या सर्व महत्त्वाच्या बाबींपासून दूर अंतरावरची ही जागा गैरसोयीची होती. कारखान्याच्या अर्थकारणाला मारक होती. पण भांडवल मिळतेय आणि त्यामुळे कारखाना सुरु करता येतोय या एकमेव आनंदापोटी विष्णुपंतानी हा अपव्याप केला. परिणाम अर्थातच कारखाना नुकसानीत जाण्यात झाला. पुढे, 'भट सावकारांचे पैसे परत करा. माझी भागीदारी काढून घ्या' असा त्यांच्या श्वशुरांचा- अभ्यंकरांचा, तगादा मागे लागला.<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..................................९१</noinclude>
nzsgl8ckoai3tnyquix68hqu7jbkbb9
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११६
104
77642
236357
202541
2026-08-30T08:12:12Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236357
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अंतर्गत कलहाने विष्णुपंतही वैतागले होते. स्वातंत्र्य नसल्याने त्याना मनासारखे प्रॉडक्शन काढता येईना की विक्री करता येईना. सांगलीकर राजेसाहेबांचे आणि अभ्यंकराचे काही तरी नाते होते; त्याआधारे विष्णुपंत राजेसाहेबाना भेटले. त्याच वेळी आणखी एक दुर्घटना घडली होती. त्यांचे सावकार भट ज्या बँकेत ठेवी ठेवत असत ती बँक बुडाली. त्यामुळे त्यांचेकडून मिळणारे भांडवल बंद झाल्यामुळे नोकरांचा पगार देणे पण जमेना. सांगलीकर राजेसाहेब प्रागतिक विचारांचे, अुद्योगधंद्याला प्रोत्साहन देणारे राजे होते. त्यानी विष्णुपंताना आवश्यक तितके पैसे दिलेच आणि वर "कारखाना सांगलीस घेऊन या, माझ्या नगरीला शोभा आणा" असे आग्रहाने सांगितले आणि विष्णुपंतानी खरोखरीच सांगलीस स्थलांतर केले.

{{gap}}सांगलीतील पदापर्णाचा दिवस होता, ७ मार्च १९१४. सर्वत्र गुढीपाडवा असल्याने गुढ्या-तोरणे अभारलेली होती. विष्णुपंतानी आणि सहकाऱ्यानी ते आपले स्वागतच समजून आनंद मानला. पण खरोखरच भविष्यकाळात त्यांच्या यशाची गुढी या सांगलीतच अभी राहायची होती!

{{gap}}इजा, बिजा, तिजा या न्यायाने लिंब, पुणे आणि आता सांगली. दरबारी लोकांच्या संमतीने गणपती मळ्यातील जागा कारखान्यासाठी पसंत केली होती. ही जागा सांगली-हरिपूर रस्त्यावर होती. निसर्गरम्य परिसर होता. रामभाऊ द्रविडांच्या रुपाने कारखान्याला एक हितकर्ता मित्रच लाभला. त्यांचे व्यवहारातील कौशल्य आणि विष्णुपंतांचे यंत्रकामातील सूक्ष्म ज्ञान, यामुळे कारखान्याची भरभराट होऊ लागली. गणपती मळ्यात दोन-तीन सोपे बांधून रंगखाते सुरु झाले होते. रुद्राप्पा ज्ञानाप्पा हातपाकी यांजसारखे सहकारी लाभल्यामुळे मनासारखी रंगणी करुन घेता येऊ लागली. मागील अनुभवांवरुन शहाणे होऊन आता एकाच तऱ्हेच्या मालाची (पातळांची) निर्मिती होत होती; सर्व कारखानदार राडीचा (चिखलासारखा पातळ व दिसावयास पिवळसर असा जर्मन रंग) रंग लुगड्याना तांबडा रंग देण्यासाठी वापरत. त्या काळात धाडस करुन नॅपथॉलचे महागडे रंग वापरण्यास श्रीगजाननमिलने सुरवात केली. त्यामुळे लुगड्याचा काठ चमकदार दिसे. म्हणून मार्केटमध्ये मालाला सतत मागणी राहिली. तीन मागाचे दहा माग झाले. कारखान्याचा पसारा वाढू लागला. तशी कारखान्याला स्वतःची जागा असावी हा विचार पुढे आला. सांगली दरबारचे कर्ज अिमाने अितबारे फेडल्याने, राजेसाहेबाना विष्णुपंतांच्या स्वच्छ व सचोटीच्या व्यवहाराची पूर्ण कल्पना आली होती; त्यामुळेच विष्णुपंताना हवी असणारी (सध्याची) दहा एकराची जागा राजेसाहेबांच्या मंजुरीने कारखान्याच्या ताब्यात आली. ही जागा अत्यंत यशदायी ठरली. या परिसरातील विहीरीला जिवंत पाणी<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.....................................९२</noinclude>
ktfosdw9l4zlcpgemi2mw38r0pt2qnp
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११७
104
77643
236358
202543
2026-08-30T08:14:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236358
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आहे; त्यामुळे रंगखात्याच्या कामात पाणी नाही म्हणून कधीही व्यत्यय आला नाही. या वास्तूच्या शेजारून जुन्या काळातील सांगली-मिरज रेल्वेचा फाटा जात होता. त्यामुळे आपोआपच कारखान्याची जाहिरात होण्यास मदत झाली. १९२२ साली ताब्यात आलेल्या या जागेवर कारखान्यास योग्य अशी बांधकामे झाल्यावर, १९२५च्या विजयादशमीच्या सुमुहूर्तावर, श्रीगजाननमिल्सची यंत्रे स्वतःच्या वास्तूत कार्यरत झाली तेव्हा विष्णुपंत वेलणकरांचा, (आता ते दादासाहेब म्हणून सर्वमान्य झाले होते) आनंद गगनात मावेना. लिंब-पुणे या ठिकाणचे अपयश आणि ते सर्वस्वी झाकून टाकणारे सध्याचे सुयश याची वारंवार मनात तुलना होऊन त्याना गहिवरुन येई.

{{gap}}यानंतर जुन्या लुगड्यांच्या जागी नव्या पातळांची निर्मिती सुरु झाली. पारंपारिक गोमेकिनारीऐवजी रुईफुल, वेल वगैरे अनेक तऱ्हेचे काठ घातले. १४ वर्षानंतर 'मनमोहक पातळे' या नावाने मार्केटमध्ये आलेले हे अत्पादन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. किनारींच्या नक्ष्यांसाठी चमक वापरल्यावर तर पातळाना आणखीनच देखणेपणा आला. पातळांचा खप वाढतच राहिला.

{{gap}}१९३५ मध्ये दादासाहेब जपानला गेले. तेथील वस्त्रोद्योगाचे त्यांनी सूक्ष्मपणे निरीक्षण केले; तेथील यंत्रे आणवून स्वतः कशी जोडायची ते शिकून, जपानी तज्ञांकडून सर्वांना कारखान्यात शिकवून दादासाहेबांनी वल्कली कापडांची निर्मिती सुरु केली. ती खूपच किफायतशीर ठरली. एकप्रकारच्या गवतासारख्या वनस्पतीपासून हे कापड बनवतात म्हणून दादासाहेबानी आपल्या परंपरेला साजेसे 'वल्कली' हे नाव त्याला दिले होते.

{{gap}}१९१२ साली तीन मागांवर सुरु केलेला हा कारखाना १९४७ पर्यंत म्हणजे गांधीहत्येनंतर जळितात आहुती पडण्यापूर्वी ३०० माग, ८००० चात्या, स्वतःची दहा एकर जमीन, विहीर, विविध खाती, नोकर लोकांसाठी चाळी असे मिळून अडीच लाख चौरस फूट बांधीव इमारत अशी कारखान्याची भक्कम स्थिती झाली आणि हे सगळं वैयक्तिक प्रयत्नांवर. (भागीदारी, शेअर होल्डर्स, न घेता) ही भरभराट दादासाहेबानी योजनापूर्वक, अगदी कागदावर गणित मांडून घडवून आणली हे विशेष. तीन माग चालू राहिले तर जेवढा नफा होतो त्यातून सावकारी कर्ज, देणी दिल्यावर एक नवीन माग घेता येतो का हे ते सातत्याने अजमावत राहिले; तशी शक्यता दिसल्यावर त्यांनी अेखादा आवडीचा छंद जोपासावा तसा हा माग खरेदीचा छंदच, म्हणा हवं तर, जोपासला. आणि असे करत करत मागांचे त्रिशतक गाठले! मात्र असे भरभक्कम यश मिळवायचे तर मूळ माणूस विलक्षण संयमी, मेहनती हवा. चार पैसे हातात आल्यावर त्याची हवा डोक्यात शिरायला नको की वेगळे रंगढंग सुचायला नकोत. तीनशे माग झाल्यावर त्यातील २२० माग सुती कापडासाठी तर ८०<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.......................................९३</noinclude>
4mz2dc4glch7np1dv0wd6xx6doch519
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११८
104
77644
236359
202544
2026-08-30T08:17:38Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236359
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>माग जपानी 'वल्कली' कापडासाठी अशी विभागणी झाली.

{{gap}}लो. टिळक १९२० साली ज्योतिषसंमेलनाच्या निमित्ताने सांगलीत आले तेव्हा त्यानी आपल्या स्वदेशीच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या दादासाहेब वेलणकरांच्या श्रीगजानन मिलला आवर्जून भेट दिली. दीड तास सर्वत्र हिंडून कारखाना बघितला. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, “आता मला यापुढे एखाद्या तरुणाने मी काय करु असे विचारले तर मी वेलणकर यांजकडे बोट दाखवेन. बोट दाखवायला अशी जागा केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो."

{{gap}}केवढे गौरवास्पद प्रशस्तिपत्र !

{{gap}}१९३९ च्या सुमारास स्पिनिंगची इमारत बांधून झाली. स्पिनिंगची यंत्रे इंग्लंडहून आली होती. विणकामखात्याची इमारत १९२५ सालीच बांधून झाली होती. १९४० साली या इमारतीत सूतकताईचे काम सुरु झाले. त्यामुळे सर्व विणकामखात्यास सुताचा पुरवठा होऊ लागला. सुतापासून तो तहत पातळ निर्माण होण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करणारी श्रीगजाननमिल्स ही एक स्वयंसिद्ध व स्वयंपूर्ण मिल झाली. ज्यादिवशी गिरणीतील सुतापासून थेट पातळाची निर्मिती कारखान्यात झाली त्यादिवशी त्या पातळाची घडी घालताना दादासाहेबांना एव्हरेस्ट जिंकल्याचा आनंद मिळाला! त्या अनुपमेय आनंदाची कल्पना अविरत कष्ट करणाऱ्या महाभागासच येऊ शकेल.

{{gap}}असे होता होता वयाची साठी केव्हा जवळ येऊन ठेपली ते दादासाहेबांना अुमगलेच नाही. आप्तेष्ट, स्नेहीमंडळी जेव्हा एकसष्ठी करायची, थाटात करायची अशा गोष्टी बोलू लागले, तेव्हा दादासाहेबाना काहीतरी खटकले. वाढदिवसाच्या दिवशी अितरांकडून काही घ्यायचे त्यांना पटेना; अुलट ज्या समाजात आपण वावरतो, त्यांच्यासाठी आपल्याला काही करता आले तर? धंदा सुरु करुन स्वतःच्या पायावर अुभे राहायचे तर धंदेशिक्षण, भांडवल अशा अनेक गोष्टी द्रव्याअभावी अडतात. मग त्यासाठी एखादा निधी अुभा करुन आपणच गरजूना मदत केली तर? या विचारमंथनातून सुवर्णतुलेची कल्पना पुढे आली. आपल्या वजनाइतके सुवर्ण समाजाला दान करायचे! म्हणजे तेवढ्या किंमतीचा एक विश्वस्त निधी निर्माण करायचा आणि त्यातून गरजू लोकाना मदतीचा हात द्यायचा. एकसष्टाव्या वर्षात पदार्पण केल्यानंतर, १९ जानेवारी १९४७ या दिवशी सुवर्ण-तुलेचा समारंभ थाटामाटात पार पडला. ज्या सांगलीच्या राजेसाहेबांनी, दादासाहेबाना गरजेच्या वेळी मदतीचा भक्कम हात पुढे केला, त्यांच्या व औंधच्या प्रगतिशील संस्थानचे संस्थानिक श्री पंतप्रतिनिधी यांचे हस्ते हा सुवर्णतुलेचा विधी संपन्न झाला. श्री. छत्रे गुरुजींच्या<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................९४</noinclude>
6978u1wzdage3c19qw7zp6xjwf3n9mj
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/११९
104
77645
236360
202545
2026-08-30T08:20:24Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236360
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>पौराहित्याखाली अनेक विद्वान ब्राम्हणांनी सर्व धार्मिक कृत्ये पार पाडली. असा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी, त्याकाळात दहाबारा हजार लोकांचा जनसमुदाय अपस्थित होता. महाराष्ट्रातील संस्थानिक, कारखानदार, अद्योगपती, म.म.दत्तो वामन पोतदार, काणे, पंडित सातवळेकर यांजसारखे अनेक विद्वज्जन आवर्जून आले होते. दादासाहेबांचे वजन १२९ पौंड भरले. दुसऱ्या पारड्यात घातलेल्या सोन्यांच्या विटांची किंमत रु. ५,३७,६००/- एवढी भरली. या रकमेतून वेगवेगळे ट्रस्ट निर्माण करुन शैक्षणिक, औद्योगिक, वैद्यकीय कार्यासाठी त्यांचा विनियोग करण्यात येतो. आजवर या ट्रस्ट माध्यमातून सुमारे वीस लाखाहून अधिक रक्कम देणगी स्वरूपात वाटली गेली आहे.

{{gap}}रोजी ४ आणे मजुरीवर काम करणारा एक सामान्य माणूस, आपल्या अंगमेहेनतीने आणि बुद्धिवैभवाने, एवढी संपत्ती समाजासाठी आपल्या प्रयत्नातून अुभी करतो हे केवढे बोलके अदाहरण समाजापुढे आहे! दुर्दैवाची बाब अशी की यापासून बोध घेणे दूरच, पण या ट्रस्टस्मधून मिळालेल्या देणगीचा आपल्या अुत्कर्षासाठी पुरेपूर अुपयोग करुन, त्या देणगीकर्त्यांच्या अुद्देशाला पुरेपूर न्याय दिला अशी अदाहरणे दादासाहेबाना दुर्दैवाने कमीच आढळली. श्रम करुन धन जोडणारे आणि अनायासे मिळालेले दानरूपी धन अुधळणारे यातील तफावत किती कमालीची असावी? पैसे मागताना जी वचने दिली जातात त्याच्या दशांशानेही पाळली जात नाहीत ही दादासाहेबांची व्यथा होती.

{{gap}}याठिकाणी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी आहे. दादासाहेबानी शालेय शिक्षण अर्धवट सोडले. बडोद्याच्या कलाभुवनमध्ये धंदेशिक्षणासाठी जाण्याचे ठरविले, तेव्हा परिस्थिती खूप वेगळी होती. ब्राह्मणाच्या मुलाने लौकिक शिक्षण घ्यावे. नंतर कोणी मामलेदार, वकील व्हावे. समाजात रावबहाद्दूर रावसाहेब म्हणून मिरवावे अशीच सर्वसाधारण अपेक्षा असे. दादासाहेबानी शिक्षण अर्धवट सोडले तेव्हा हा बिचारा आता घिसाडी, सुतार किंवा एखादा कोष्टी होणार म्हणून सर्वानी नाके मुरडली. पण गंमत बघा. याच माणसाने स्वप्रयत्नांवर ३ मागांपासून तो ३०० माग आणि ८००० चात्यांनी सुसज्ज असा कारखाना नावारुपास आणला. ३००- ४०० कामगारांना रोजची रोजी-रोटी मिळवून दिली. अनेक सुशिक्षित, पदवीधर मंडळी त्यांच्या हाताखाली कामाला राहिली. त्यांच्या सुवर्णतुलेच्या प्रसंगी अनेक वकील, मामलेदार, डॉक्टर्स अपस्थित तर होतेच पण विद्वान पंडित, अुच्च अधिकारी आणि राजे-महाराजे अशा प्रतिष्ठितांची लक्षणीय अपस्थिती होती.

{{gap}}म्हणजे वेलणकर ‘घिसाडी' होणार म्हणून टिंगलटवाळी करणाऱ्यांच्या कुत्सित<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...............................९५</noinclude>
6ezpjddnqigw2ootfu11u9q9o8szmy9
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२०
104
77646
236361
202547
2026-08-30T08:22:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236361
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>नजरेला केवढे भव्य दृश्य, सुवर्णतुलेच्या प्रसंगी दिसले असेल?

{{gap}}सुवर्णतुलेच्या निमित्ताने नाही म्हटले तरी संपत्तीचे थोडे प्रदर्शन समाजाला झालेच. नुसते दर्शन नेहमीच होत होते. पण थाटामाटाच्या समारंभाने काही मंडळींची डोकी असुयेने, मत्सराने पेटून निघाली हे निश्चित! ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद जाणुनबुजून पसरवला जात होता. वेलणकर पडले ब्राह्मण कारखानदार; त्यातच महात्मा गांधींचा खून करणारा मारेकरी जातीने ब्राह्मण निघाला. गांधीहत्येनंतर जी दंगल माजली त्याची फार मोठी झळ श्रीगजाननमिलला पोचली. सुरुवातीला त्याचे वर्णन आले आहेच. त्या काळातील सरकारी आकड्यानुसार अंदाजे रु.२० लाखाचे वर नुकसान म्हणजे आजच्या काळातील ८-१० कोटीचे वर होईल. केवढा जबरदस्त फटका!

{{gap}}खरं म्हणजे वेड लावणारीच परिस्थिती होती. पण सच्च्या लढवय्याला शत्रूने चारी बाजूने घेरुन टाकल्यावरच खरे स्फुरण चढते. दादासाहेबांचे तसेच झाले. त्यांची पाठ जमिनीला लागावी म्हणून मत्सराने पेटलेल्या समाजकंटकांची पाशवी अिच्छा, त्यांच्यासारखा जातिवंत पैलवान थोडीच पुरी होऊ देणार? सगळी मरगळ एका झटक्यात बाजूला टाकून दादासाहेब कामाला लागले. वेडेवाकडे, अर्धवर्तुळाकार झालेले पत्रे, सरळ करायच्या प्रयत्नात त्यांनी चक्क तशा प्रकारचे यंत्रच तयार केले. अग्निप्रलयातून वाचलेल्या साधनसामुग्रीचा अंदाज घेतला. ते स्वतः आपत्काली अुपयोगी पडावे म्हणून नियमितपणे शिल्लक बँकेत टाकत, ती रक्कम, संरक्षक निधी म्हणून मदतीस आली. मुंबईत घेऊन ठेवलेल्या चाळी विकल्या. एवढे मोठे गंडांतर येऊनसुद्धा त्यानी नेहमीप्रमाणे वेळेवर कामगारांचे पगार केले. मालकाची जिद्द पाहून सर्वानाच स्फुरण चढले. हळूहळू कारखाना कामाला लागला. पूर्वस्थितीला येऊ लागला.......

{{gap}}दादासाहेबांचे वय आता ६६-६७ वर्षाचे झाले. चिरंजीव रामराव बी. कॉम. होऊन कर्तेसवरते झाले होते. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक जाचक अटींमुळे दादासाहेब वैतागून जात; तेव्हा आता कारखान्याची संपूर्ण जबाबदारी रामरावांच्या खांद्यावर टाकून त्यांच्या कर्तृत्वाला धुमारे फुटू द्यावेत अशा भावनेतून दादासाहेबांनी समारंभपूर्वक दि. २० सप्टेंबर १९५३ रोजी, ४५ वर्षे अपत्यवत जपणूक केलेली श्रीगजाननामिल रामरावांच्या स्वाधीन केली.

{{gap}}इथे दादासाहेबांच्या आयुष्याचा एक मोठा अध्याय संपला.

{{gap}}यापुढे कारखान्याच्या कारभारात प्रत्यक्षपणे हस्तक्षेप त्यांनी कधी केला नाही; मात्र दैनंदिन व्यवहाराशी ते संबंधित राहिले. त्यामुळे योग्य सल्लामसलत देण्यात त्यांना कधी अडचण आली नाही.{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...................................९६</noinclude>
4hgk5gxpqgu4hm7mexoqxchz8vh52nj
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२१
104
77647
236362
202548
2026-08-30T08:26:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236362
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}आपल्या या आगळ्यावेगळ्या वानप्रस्थानाश्रमातसुध्दा त्यांनी आयुष्याचे मिनिट अन् मिनिट कारणी लावले. कानानी ऐकायला कमी येऊ लागले ही त्याना एकप्रकारे अिष्टापत्तीच वाटली. त्यानी म्हटलय की “कान सोडून गेल्यामुळे माझं लिखाण चांगलं व्हायला लागलं, एकाग्रता साधू लागली.” या अुतारवयात त्यांनी थोडीथोडकी नाहीत तर चांगली १४ पुस्तके लिहून काढली. आपल्या अुद्योगविषयक अनुभवांवरुन ‘यांत्रिक मागवाला,' ‘कारखानदार कसा झालो' अशी पुस्तके लिहिलीच. पण वृध्दापकाळात भेडसावणाऱ्या समस्यांचा शोध घेत 'वृध्दांची स्वास्थ्यसाधना' 'माझे वृध्दपण' सारखी पुस्तके लिहली. जपानच्या प्रवासाच्या अनुषंगाने 'जपानच्या प्रवासाची शिदोरी', तेथील लोकांची शालीनता पाहून प्रभावित होऊन, 'जगात वागावे कसे?' यांसारखी व काही धार्मिक पुस्तके त्यांच्या हातून लिहून झाली. 'जगात वागावे कसे' या पुस्तकाच्या तर अनेक आवृत्या निघाल्या. एका कारखानदारी करणाऱ्या माणसाची ही वाङ्मयसेवा पाहून जातिवंत साहित्यिकसुद्धा आश्चर्याने तोंडात बोटे घालतील. त्यांची ज्ञानलालसा विलक्षण होती. काहीही चांगले वाचले की ते त्याच्या नोट्स काढत. अमूल्य माहिती, सुभाषिते टिपून ठेवत. अशा अनेक वह्या त्यांच्या संग्रही होत्या.

{{gap}}व्यायाम हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. अखेरपर्यंत त्यांची योगासने, नियमित व्यायाम टिकून होता. आयुष्यातील अनेक आघात पचवायला त्यांच्या शरीरबलाने त्यांना फार मदत केली. सुदृढ शरीरात सुदृढ मन वास करते. १९४८ सालच्या जळितासारखे प्रचंड गंडांतर, या मनोबलावरच त्यांनी पचवले. अनेक कुस्तिगीरांना, व्यायामपटूंना त्यानी आर्थिक मदत केली.

{{gap}}त्यांचा पिंड हा मानवतावादी होता. ते हाडाचे देशभक्त होते. मूर्तीपूजेकडे आवश्यकतेपेक्षा अधिक लक्ष देत बसल्याने, चालता बोलता जो माणूस आहे, त्याच्याकडे आपले दुर्लक्ष होत आहे, याची त्यांना स्वतःला जशी ठाम जाणीव होती तशीच ती अितराना करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न असे. या जाणिवेपोटीच त्यांनी समाजपयोगी संस्थांना, व्यक्तींना देणग्या दिल्या.

{{gap}}वयाची ९१ वर्षे पूर्ण केल्यावर वृध्दापकाळामुळे २१ एप्रिल १९७८ रोजी त्यांचे निधन झाले.

{{gap}}त्यांच्या सुवर्णतुलेच्या समारंभप्रसंगी सांगलीच्या राजेसाहेबांनी म्हटले होते की “श्रीगजाननमिलचे भव्य दृश्य व त्याचे धनी वेलणकर आपणास आज दिसतात पण हे दृश्य निर्माण करण्यासाठी पूर्वी येथे जी पडकी जागा होती, त्या जागेमध्ये कार्याचे वेड लागल्यामुळे, या कार्याची रात्री बेरात्री योजना करीत हिंडणारे व दुःखे सोसणारे वेलणकर आपणास माहीत नाहीत पण ते 'वेलणकर' मला माहित<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर................................९७</noinclude>
k7ach9jbd7fuox98xohgvrkklo3cph1
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१२२
104
77648
236363
202550
2026-08-30T08:29:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236363
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आहेत.....सुवर्णतुलेच्या दानाने त्यांनी समाजाचे ऋण अत्कृष्ट तऱ्हेने फेडले आहे."

{{gap}}दादासाहेब वेलणकर यानी चार आणे मजुरीपासून सुरुवात केली. व्यापारातील सचोटी, चिकाटी आणि हातोटी या त्रिगुणांवर ते कुठच्या कुठे जाऊन पोहोचले. रोम काही एक दिवसात बांधले गेले नाही! त्यांचा विलक्षण काटकसरीपणा, मिळालेला फायदा पुन्हा धंद्यातच घालून तो वाढविण्याची त्यांची सततची धडपड, बाजारपेठेचे ज्ञान, तदनुरुप मालाची अत्पत्ती यामुळेच वर्षानुवर्षांच्या तपश्चर्येनंतर ते आपले 'रोम' बांधू शकले. या कालावधीत त्यांनी तीन हजारावर मजुरांना शिकवून तयार केले. त्यामुळे सांगली हे एक विणकाम व सूत केंद्र बनले. पाठोपाठ चार सुताच्या गिरण्या अभ्या राहिल्या. जवळच्या इचलकरंजीला सहस्त्रावधी यांत्रिक माग व त्याचे चौपटीने हातमाग कारखाने सुरु झाले. त्यांच्या लाकडी वळकटीच्या (बीम) युक्तीने लहान लहान कारखान्यांचे जाळे पसरले. ह्या धंद्यात ठामपणे अभे राहून यश संपादन करता येते, हा विश्वास श्रीगजाननमिलच्या यशाने, अनेकांच्या मनात जागृत झाला. हँडलूमवर चालणारी पातळे ही पॉवरलूमवर आणायची पहिली कल्पना त्यांचीच आणि सर्व प्रथम राबवली त्यानीच. तोवर भारतात पॉवरलूमवर पातळे निघाली नव्हती. त्याच्यावर रुईफुलासारख्या बॉर्डर्स त्यानी बसविल्या. टेक्स्टाईल इंडस्ट्रीत अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी त्यानी यशस्वी केल्या.

{{gap}}सांगली नगरीला औद्योगिक क्षेत्रात नाव मिळवून देण्याचे, दिगंत कीर्ती मिळवून देण्याचे त्यांचे श्रेय फार मोठे आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी सांगलीच्या राजेसाहेबानी १९४७ मध्ये त्याना 'अुद्योगरत्न' ही पदवी दिली पण त्यांची ओळख महाराष्ट्राला 'धनी वेलणकर' म्हणूनच झाली होती. हा गौरवशाली शब्द त्यांच्याविषयी आदराने बोलताना, १९३८ साली, स्वातंत्र्यवीर सावरकरानी प्रथम अुच्चारला. त्या थोर पुरुषाची वाणी १९४८ च्या सुवर्णतुलेनंतर अधिकच सार्थ झाली. सात्विकतेने मिळवलेल्या संपत्तीचे 'धनी' म्हणून त्या संबोधनाला एक प्रतिष्ठा आहे.

{{gap}}आजहि 'धनी' शब्द अच्चारला की सांगलीकरांच्या तोंडी अत्स्फूर्तपणे 'वेलणकर' हेच नाव येते.

{{gap}}ही ओळख केवढी हृद्य आणि प्रत्ययकारी आहे!

{{center|●●●}}
{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...................................९८</noinclude>
rkktftfh8dkeiptssf62qu7ydcl6i5b
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६५
104
111862
236333
236084
2026-08-29T16:48:04Z
कल्पनाशक्ती
3813
236333
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|५४ |लंकेचं वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>फुलझाडांचें व छोट्या पाम वृक्षांचें एक वर्तुळ मनुष्याचें लक्ष वेधतें. समोर लांबच लांब पांढऱ्या शुभ्र रेतीचा रस्ता केला आहे. त्याचे दोन्ही बाजूंस वेलींनीं वेष्टिलेल्या वृक्षांच्या राजी लावल्या आहेत. त्या वृक्षांच्या खांद्यांनी त्या सर्व रेतीच्या रस्त्याभर जणूं कांहीं कमानदार बोगदा बनविला आहे, असा प्रवाशांस त्या रस्त्याने जातांना भास होतो. या रस्त्यानें बागेत जाऊं लागलें म्हणजे बाग बनविणाऱ्या योजकाच्या रचना-कौशल्याचें कौतुक केल्यावांचून रहावत नाहीं. हा शीतल सावलीचा बोगदा टाकून पुढे यावें तो खुलेंच खुलें पण जिकडे तिकडे हिरवेंगार दिसणारे वर्तुळाकार मैदान लागतें. या वर्तुळाचे परीघावर लहानमोठे नानावृक्ष सतेज पानाफुलांनी डहुरलेले दृष्टीस पडतात. हे सर्व वृक्ष ही बाग पहावयास येणाऱ्या राजवंशीय प्रख्यात पाहुण्यांच्या हस्ते त्यांच्या भेटीच्या स्मरणार्थ लाविलेले असून त्या प्रत्येक वृक्षाचे बुंध्याशी पाहुण्याचें नांव व त्यांचे हस्ते वृक्ष लावल्या दिवसाची तारीख लिहिलेले फलक जमिनींत खोचून ठेवलेले दृष्टीस पडतात. या स्मारक वृक्षांचेही मोठे कौतुक वाटतें. हें वर्तुळ टाकून पुढें जावें तो ''''रायल पाम'''' नांवाची वृक्षराजी मनुष्याचें मन आकर्षण करून घेते. हे पामवृक्ष साहा साहा फुटांचे अंतरानें दुतर्फा लावलेले आहेत. या रस्त्यानें जाण्यास तब्बल पांच मिनिटे लागतात. हा वृक्षराजीनें अलंकृत केलेला रस्ता टाकला की बागेचें चिंचोळें टोंकच येते. येथून नदीपलीकडे जाण्यास होडी असून त्यानें नदीपलीकडील प्रयोगक्षेत्राला जातां येतें.
{{gap}}एकदां मी सबंद बागेला फेरी घातली. नदीच्या तिन्ही बाजूंना अगदीं नदीकांठानें पायवाट ठेविली आहे; ती पायवाट सुमारें तीन मैलांची आहे; ती चालण्यास मला एक तास लागला. प्रवेशद्वाराकडून डाव्या बाजूने गेलं म्हणजे एक छोटासा तलाव लागतो. हा तलाव मात्र बागेच्या मानानें फार लहान वाटतो व अगदीं डबक्याप्रमाणे भासतो. यांत अर्थात् पाणवेली व कमलवेली आहेत. या तलावाचे बाजूनें पायवाट जाते तीच नदीकाठची पायवाट. या वाटेनें गेलें म्हणजे खोल पात्राच्या{{nop}}<noinclude></noinclude>
fnw3zjitnabqvbw06wskszpdor6ssgq
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/६६
104
111863
236332
236085
2026-08-29T16:47:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236332
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 66 पेरेडॅनिया बागेतील तालीपॉट पामची दुहेरी रांग.jpg|borderless|center|पेरेडॅनिया बागेतील तालीपॉट पामची दुहेरी रांग]]
{{center|'''पेरेडॅनिया बागेतील तालीपॉट पामची दुहेरी रांग.'''}}
{{rh|नं. ४||पान ५४}}
{{nop}}<noinclude></noinclude>
alyjc3erls4hwls5xyqgr5mgwig9jme
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७२
104
111888
236335
236156
2026-08-29T16:49:20Z
कल्पनाशक्ती
3813
236335
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|६० |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>नाहीं. या रस्त्यानें पुढे गेलें कीं पूर्वीच्या कँडीच्या राजवाड्याचें विटांच्या बांधणीचें तटवजा पण खुजा भिंतीचें आवार लागतें. पुढ डाव्या हाताला हिरव्यागार हरळीनें हिरव्यागालीच्याप्रमाणे दिसणारें खेळाचं मैदान लागतें. लगेच बुद्धाचें दंत-देवालय लागतें. या देवालयाला राजवाडयाच्या धर्तीची तटवजा भिंत आहे. नव्हे हें देवालय राजवाडयाचा एक भागच आहे व देऊळ धरून मोठ्या थोरल्या आवाराला सुंदर जोतें व सुंदर तटवजा खुजी भिंत बांधलेली आहे. आतां राजवाड्याचें सर्व आवार व त्यामधील सर्व इमारती व राजवाडे हे सिलोन सरकारचे असून मुख्य राजवाड्यात सिलोनचे गव्हरनर कँडीस आले म्हणजे राहतात व दुसऱ्या इमारतीत न्याय कचेरी भरते. न्याय कचेरीची इमारत लांकडी असून त्याचे लांकडी खांब फार नक्षीचे आहेत. या इमारतींची नवलाईची गोष्ट म्हणजे या इमारतीचें छप्पर नेहेमींसारखें कवलारू नसून ते विटांनी बनविलेले आहे.
{{gap}}दंतदेवालयाची इमारत विटांचीच आहे; त्याच्या प्रवेशद्वारा नजीक पाण्याचा हौद आहे व उजव्या हाताला दुमजली वाटोळी व कंगोऱ्या कंगोऱ्याची छोटी इमारत आहे. त्यांत बुद्ध धर्माचे ग्रंथसंग्रहालय आहे. देवळांत गेलें म्हणजे एक सोपा लागतो, तेथे एक कारंजें आहे. पुढें बुद्धाच्या बैठ्या व हातावर डोके ठेवून आडव्या निजलेल्या दगडी मूर्ति आहेत. बुद्धाचा दंत ठेवण्याकरितां मोठ्या कुलुपानें रक्षण केलेलें गृह आहे. बुद्धाचा हा दंत बाहेर काढून दर आगष्ट महिन्यांत त्याची मोठी मिरवणूक काढतात. या महायात्रेला पुष्कळ यात्रेकरू जमतात. मोठमोठ्या शृंगारलेल्या हत्तींनीं पुरस्कृत अशी ही प्रचंड मिरवणूक असते. या दंत-देवळाला बरींच दालने आहेत. बुद्धलोकांमध्ये तांबड्या व पिवळ्या चाफ्याची फुलें मूर्तीपुढें व स्तूपासभोंवार वाहण्याची पद्धती दिसली. कालिनी येथील बुद्धमंदिराप्रमाणे येथेही भली थोरली एक नवी इमारत चालू आहे.
{{gap}}हिंदुस्थानांतील बुद्धधर्माचे अवशेष— स्तूपविहार चैत्य वगैरे- हे पूर्वकाळी बांधलेले किंवा कोरलेले जे काय आतांपर्यंत शिल्लक राहिले{{nop}}<noinclude></noinclude>
g6t8mp0pdko087to6hi0i2alo25irmr
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/७३
104
111889
236334
236157
2026-08-29T16:49:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236334
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 73 कँडीचें दंतदेवालय व दागबा.jpg|center|borderless|कँडीचें दंतदेवालय व दागबा]]
{{center|'''कँडीचें दंतदेवालय व दागबा.'''}}
{{rh|नं. ५||पान ६०}}
{{nop}}<noinclude></noinclude>
bs2ojvjvyr2oxj4l5z8tm8ub5f2bglu
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८२
104
111900
236336
236174
2026-08-29T16:50:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236336
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 82 दांबूलच्या खडक देवळांतील मूर्ति.jpg|center|borderless|दांबूलच्या खडक देवळांतील मूर्ति]]
{{center|'''दांबूलच्या खडक देवळांतील मूर्ति.'''}}
{{rh|नं. ७||पान ६८}}
{{nop}}<noinclude></noinclude>
ri314ssvf9g90qm58lurjitubtckmh3
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८६
104
111905
236338
236208
2026-08-29T16:51:37Z
कल्पनाशक्ती
3813
236338
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|७२ |लंकेचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>डाच्या पायऱ्या दिसतात. पहिल्या पायरीच्या दोन्ही बाजूंस बरेंच रुंद विट काम दिसतें. आतां त्यावरचा चुन्याचा गिलावा पार गेला आहे; पण जरा बारकाईने पाहिलें कीं त्या विटकामावरून व अवशिष्ट राहिलेल्या गिलाव्यावरून येथें प्रचंड सिंहाच्या मोठ्या जबड्याचे चित्र चुन्याच्या गिलाव्यांत केलें होतें असें कळून येतें व या खडक-किल्ल्याला 'सिगिरीया ' (मूळ संस्कृत सिंहगिरी) कां नांव देण्यांत आलें हें स्पष्टपणे कळतें व हें ठिकाण बनविणाऱ्या शिल्पकाराच्या कौशल्याचें विलक्षण कौतुक वाटतें. एखाद्या राजवाड्याला जसा गिलाव्यानें गुळगुळीत केलेला सुंदर चित्रांनीं व नाजुक नक्षीकामानें सुशोभित केलेला जिना असावा तसा जिना या सिंहाच्या जबड्यांतून केला आहे असें वाटतें. पण हा जिना चढू लागलें म्हणजे त्या खडकाचा भीषणपणा ध्यानांत येतो. कारण जरा चढल्याबरोबर उजव्या बाजूला डोक्यावर लोंबणाऱ्या निसरड्या खडकाखेरीज कांहीं एक नाहीं असें ध्यानांत येतें. डाव्या बाजूस मात्र विटांची गुळगुळीत गिलाव्याची कठड्यासारखी छातीभर उंच भिंत लागते. पण पुढे हा जिना एकाएकीं संपलेला व तुटलेला दिसतो व या खडकाचें भीषण स्वरूप ध्यानांत येऊन घेरी आल्यासारखें वाटतें. कारण आपला जिना अधांत्रीं असून डाव्या हातास खोल खोल दरी व उजव्या हातास भिंतीसारखा खडकच आहे असें दिसतें. मग या राजवाड्याच्यासारख्या सुगम जिन्याच्या कौशल्याच्या कृतीनें मन थक्क होऊन जातें. या भिंतीसारख्या खडकाला फूट दोन फुटाची भिंत बांधतां येईल अशा अंतरावर खडकांत दोन दोन भोकें थोड्या थोड्या अंतरावर केलेलीं दृष्टीस पडतात व या जिन्याच्या कृतीचें कसब ध्यानांत येतें. या भोकांत लोखंडी किंवा लाकडी गज घट्ट न निसटतील अशा तऱ्हेनें बसविले असले पाहिजेत; व मग त्या गजांना भिंतींत बुजवून पण त्या गजांचे आधारावर जिन्याची चढती चढती भिंत बांधीत आणली असली पाहिजे. अशी भिंत बांधीत आणल्यावर खडक व भिंत यांचेमध्यें जी दोन चार फूट जागा झाली त्यांत पायऱ्या{{nop}}<noinclude></noinclude>
8hljyq7dwopz6u15dfg9h6bk023fxpd
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/८७
104
111906
236337
236234
2026-08-29T16:51:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236337
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 87 खडक किल्ल्यावर जाण्याचा जिना सिगिरिया.jpg|center|borderless|खडक किल्ल्यावर जाण्याचा जिना सिगिरिया]]
{{center|'''खडक किल्ल्यावर जाण्याचा जिना, सिगिरिया.'''}}
{{rh|नं. ८||पान ७२}}
{{nop}}<noinclude></noinclude>
620we7eymdywti714av7171iuh8hyof
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०३
104
111922
236340
236229
2026-08-29T16:52:43Z
कल्पनाशक्ती
3813
236340
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|८८ |लंकेच वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>वजन आहे. डच राजवटीच्या वेळच्या किती तरी इमारती व त्यांचे अवशेष अजून त्रिंकोमालींत पाहण्यास सांपडतात. डच नांवें व डच तऱ्हेची घरबांधणी येथें दिसून येते; शेवटीं लंका हें बंदर इंग्रज लोकांच्या ताब्यात आलें. आतां तर त्रिंकोमाली येथें ब्रिटिश आरमारी आड्डा- सिंगापुरच्या पुरवणी दाखल करण्याचा ब्रिटिश सरकारचा बेत असल्यामुळें या बंदराला जास्तच महत्त्व आलें आहे व कालेकरून जास्त जास्तच येणार असा रंग दिसतो.
{{gap}}त्रिंकोमाली हे मुंबई बंदराप्रमाणें एक स्वाभाविक बंदर आहे. त्याची भौगोलिक उपस्थिति थेट मुंबईच्याप्रमाणे आहे. मात्र मुंबई बंदर हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्यावरील व आरबी समुद्रावरील बंदर आहे, तर त्रिंकोमाली हे सिलोन बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील व बंगालच्या उपसागरावरील बंदर आहे. यामुळे दिशांची अदलाबदल झाली आहे. बाकी बंदराची स्वाभाविक ठेवण सारखी आहे. मुंबई बंदर मुंबई बेटाच्या पूर्वेस आहे तर त्रिंकोमाली बंदर शहराच्या पश्चिमेस आहे. मुंबई बंदराचें मुख दक्षिणेकडे आहे, तर त्रिंकोमाली बंदराचें उत्तरेकडे आहे, मुंबई बंदराच्या नजीक पनवेलची खाडी येऊन मिळते; तर त्रिंकोमाली बंदराच्या नजीक महावेली गंगा नदीची खाडी येऊन मिळते; मुंबईची मलबार टेकडी समुद्रावरील वारा व लाटा यांपासून बंदराचें संरक्षण करते; तर त्रिंकोमालीची गर्दछाय टेकडी बंदराचें वादळापासून संरक्षण करते; मुंबईला जसा बॅकवे नांवाचा उथळ पाण्याचा अर्धवर्तुळाकार भाग आहे; तसा त्रिंकोमालीस डचबे नांवाचा अर्धवर्तुळाकार भाग आहे. मुंबईचें कुलाबा टोंक बंदराच्या पश्चिमेस मुख्य समुद्राच्या बाजूचें टोक असून तेथें दीपगृह आहे; तर त्रिंकोमालीचे पूर्वेस मुख्य उपसागराच्या बाजूचें टोंक फाऊल पॉईंट म्हणून आहे व तेथें दीपगृह आहे. ज्याप्रमाणें मुख्य समुद्रासमोर व मुख्य समुदाच्या लाटा व वारा मिळणारे नेपीयनसी व महालक्ष्मी हे भाग आहेत, त्याप्रमाणें त्रिंकोमालीस फ्रेडरिक किल्ल्याचा किनारा व बॅकबे हा भाग आहे. दोन्हींही बंदरें खूप खोल पाण्याचीं व{{nop}}<noinclude></noinclude>
tmpgnr1x9tjodexpim75bb273z4qj6p
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०४
104
111923
236339
236231
2026-08-29T16:52:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236339
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 104 त्रिंकोमालीच्या किल्ल्याचा तट.jpg|center|borderless|त्रिंकोमालीच्या किल्ल्याचा तट]]
{{center|'''त्रिंकोमालीच्या किल्ल्याचा तट.'''}}
{{rh|नं. ९||पान ८९}}
{{nop}}<noinclude></noinclude>
o1k6sby240rfir62ke5e7yd3h66jwtr
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०७
104
111938
236341
236249
2026-08-29T16:53:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236341
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 107 त्रिंकोमालीचा स्वामी खडक.jpg|center|borderless|त्रिंकोमालीचा स्वामी खडक]]
{{center|'''त्रिंकोमालीचा 'स्वामी खडक''''}}
{{rh|नं. १०||पान ९१}}
{{nop}}<noinclude></noinclude>
7izqlspbc6r0c7k1uj7nu8n7n02jq8u
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११४
104
111939
236343
236250
2026-08-29T16:54:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236343
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 114 थुपाराम विहार पोलनरुवा.jpg|center|borderless|थुपाराम विहार पोलनरुवा]]
{{center|'''थुपाराम विहार पोलनरुवा.'''}}
{{rh|नं. ११||पान ९७}}
{{nop}}<noinclude></noinclude>
iprbr7cpfmilmq9rafbw1dazcd3ptyl
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११७
104
111940
236345
236251
2026-08-29T16:55:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236345
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 117 वर्तुळाकार स्मारक देवालय वातदागे पोलनरुवा.jpg|center|borderless|वर्तुळाकार स्मारक देवालय वातदागे पोलनरुवा]]
{{center|'''वर्तुळाकार स्मारक - देवालय वातदागे, पोलनरुवा.'''}}
{{rh|नं. १२||पान ९८ }}
{{nop}}<noinclude></noinclude>
jdx91u6klnarvmujag7aitonfa8wg41
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१०६
104
111941
236342
236254
2026-08-29T16:53:45Z
कल्पनाशक्ती
3813
236342
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९०|लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>दोन अडीचशें फुट उंच असल्यामुळे या बाजूनें किल्ल्याला स्वाभाविक तटच झाला आहे. फक्त किल्ल्याचा शहराला जोडणारा प्रवेश भाग सखल आहे. त्या बाजूसच रुंद व मजबूत तट बांधलेला आहे. किल्ल्याचें प्रवेशद्वार या सखल भागांतून आहे. सध्यां किल्ल्याला लष्करी महत्त्व कांहींच नाहीं; येथें सध्यां सरकारी बंगले असून सरकारी बरेच अंमलदार या बंगल्यांतून राहतात. बालसिंघमचा बंगला किल्ल्याचे एका टोकास असून बऱ्याच उंचवट्यावर आहे. बंगल्याचें जोतेंही खुप उंच आहे. यामुळें बंगला उठावांत दिसतो. बंगला एक मजलीच आहे. पण त्याची खुप उंच मांडावण आहे. पूर्वी हें एक छोटे प्रार्थनामंदिर होतें. त्याचीच दुरुस्ती व डागडुजी करून सध्यांचा बंगला बनविण्यांत आला आहे. बंगला उंचवट्याच्या टोकावर असून समुद्राच्या बाजूस त्याला खुला रुंद व्हरांडा आहे. यामुळें या बंगल्यांतून बंगालचा उपसागर व त्याचें भव्य स्वरूप मोठें चित्ताकर्षक भासतें. बंगालच्या उपसागराचें अफाट पसरलेलें हिरवट निळसर पाणी, थाडथाड आवाज करीत बंगल्याच्या खडकावर आपटणाऱ्या त्या प्रचंड लाटा; त्या लाटांनी फेसाळलेलें तें पाणी, समोरच असलेला फाऊल पॉईंट व तेथलें पांढरें शुभ्र दीपगृह; हा देखावा अद्वितीय आहे; प्रातःकाळीं तर हा देखावा अधिकच रमणीय दिसतो. अरुणोदय झाला की पूर्वदिशा रक्तवर्ण होऊं लागते व समुद्राच्या निळसर हिरवट पाण्यावर उदय पावणाऱ्या सूर्यनारायणाचा प्रकाश पडला म्हणजे समुद्र विविध रंगी प्रचंड धनुष्याकार धारण करतो. उजव्या बाजूस डच पॉईंट व बंदराला संरक्षिणाऱ्या टेंकडीचें एक टोक आहे. त्यावर जिल्ह्याच्या कलेक्टरचा (याला लंकेंत गव्हर्मेंट एजंट म्हणतात) बंगला आहे.
{{gap}}सूर्यनारायणानें समुद्रांतून आपले डोके वर काढलें म्हणजे जिकडे तिकडे प्रकाशच प्रकाश होऊन जातो; सकाळीं क्षितिजावर ढग असले तर निराळीच शोभा दिसते; त्यावेळीं प्रत्यक्ष सूर्यनारायण ढगाचे मागें लपलेला असतो, पण सूर्य किरणांमुळे ढगांवर तांबडा, केशरी पिवळा{{nop}}<noinclude></noinclude>
7prtkzw2agnp3z87ppryui5x23s2imz
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११३
104
111947
236344
236261
2026-08-29T16:54:51Z
कल्पनाशक्ती
3813
236344
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>तील प्रगतीचें कौतुक वाटतें. आमची मोटार निघाली तो अगदी काळोख पडला. येथून पोलनुरुवा चवदा पंधरा मैल आहे. हा सर्व भाग जंगलमय आहे. अरण्यांत सर्वत्र अंधार झाला. मोटारच्या दिव्याच्या प्रकाशानें समोरचा काय तो रस्ता दिसत होता; आतां रानकिड्यांचा किरकिर स्वर सारखा सुरू झाला. दोन्ही बाजूंस गुडूप अंधार, तो रानकिड्यांचा कर्णकटु स्वर, रस्त्याला लागून असलेल्या हिरव्यागार झाडावर पडणारा तो विजेच्या दिव्याचा धावता प्रकाश व मोठ्या वेगाने जाणारी ती एकाकी मोटारबस या सर्व गोष्टी मनांत भीति उत्पन्न करीत. अशा या निबीड अरण्यांत रात्रीचेवेळी जर मोटार बंद पडली, तर काय होईल असा भयप्रद विचार वारंवार मनांत येई; पण इतक्यांत अरण्य कमी होऊन तुरळक खुला भाग व मग क्वचित् झोपडी दिसूं लागली. तेव्हां आपण अरण्य टाकून शहरानजीक आलों असें कळलें व जीवांत जीव आला. मी सुमारें साडेसात वाजतां पोलनुरुवा येथें पोहोंचलों. मी रा. हँडी नांवाच्या तेथील पोस्टमास्तरना पेरेडॅनीयाहून रा. कनकरत्न नांवाच्या शेतकी खात्यांतील एका अंमलदाराचे परिचय-पत्र आणलें होतें. मोटारनें सरळ रस्त्यावर असलेल्या पोस्टमास्तरचे बंगल्याशी मला उतरविलें. बंगल्यांत कोणींच नव्हतें. पण पुढचा व्हरांडा खुला होता. तेथें सामान ठेवतों तोंच बंगल्यांतील नोकरानें माझें सामान हॉलमध्ये नेवून ठेवलें व मला बसावयास खुर्ची दिली. मी बराच वेळ वाट पाहिली, पण पोस्टमास्तरांचा पत्ता नाहीं, शेवटीं साडेआठ वाजल्यावर ते गृहस्थ आले. त्यांनीं तार पोहोंचल्याचे सांगितले व माझें आदरानें स्वागत केलें. पोस्टमास्तर बंगल्यांत एकटे रहात असून त्यांनी बायकामुळे मुलांच्या शिक्षणाकरितां जाफना येथें ठेविलीं आहेत असें कळलें. जेवणखाण आटोपून मी लागलींच निजलों. सबंद दिवसाच्या प्रवासाच्या श्रमानें व त्रासानें दमल्यामुळे मला लागलींच झोप लागली. मी सकाळी उठतों तों सारखा पाऊस पडत आहे. न्याहारी झाली तरी "पाऊस थांबण्याचें चिन्ह नाहीं. पण पाऊस फार जोराचा नव्हता,{{nop}}<noinclude></noinclude>
8laun483bf30yk757icwxvkx0jecqsq
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/११६
104
111949
236346
236263
2026-08-29T16:56:01Z
कल्पनाशक्ती
3813
236346
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|९८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>इमारतीला शोभेशी भव्य मूर्ति! इमारतीला साजेसा प्रशस्त जिना! या इमारतीचा प्रमाणशीरपणा व एकंदर बांधणी पूर्वकाळच्या बांधकलेच्या प्रगतीची उत्तम साक्ष पटवितात. जिन्यावरून वर गच्चीवर गेलें म्हणजे सभोवारचा हिरवागार देखावा व जागोजाग इमारतीचे व स्तूपांचे उंच मनोर दृष्टीस पडतात व या राजधानीच्या पूर्ववैभवाचें व विस्ताराचं मोठें आश्चर्य वाटतें. थूपाराम विहारानजीक '''निसंक''' लतामंडप नांवाचा मंडप लागतो. हा अष्टदल कमळाच्या आकाराचा, दगडी खांबाचा व दगडी कठड्याचा सुंदर मंडप आहे. या कठड्याचें काम सांची येथील कठड्याच्या कामापेक्षां साधें पण सुबक आहे. मंडपांत प्रवेश केला म्हणजे या बांधकलेच्या कामाचा मनावर फारच अनुकूल परिणाम होतो. याचेजवळ सत्तावीस फूट लांब, चार फूट रुंद व दोन फूट उंच असा मोठा दगडी फलक आहे व त्यावर मोठा शिलालेख खोदलेला आहे. पुढे '''हेतदागे''' नांवाची बुद्धाचे अवशेष ठेवण्याची इमारत आहे. ही इमारत बरीच पडलेली आहे; पण अवशेषावरूनही तिचें शिल्पकाम उच्च दर्जाचं आहे हें समजतें. याचे बाजूस सातमहाल नांवाची एक विलक्षण इमारत आहे. हिचे नावांप्रमाणें सात मजले असावे; पण सध्यां साहा मजलेच आहेत. या इमारतीच्या आंत मुळीं जातांच येत नाहीं. हिचा शंकूसारखा निमुळता आकार आहे. या इमारतीचा काय व कसा उपयोग करीत किंवा ती बांधण्याचा काय उद्देश हे एक मोठें गूढ आहे. या ठिकाणच्या इमारतीचा मुकुटमणी म्हणजे '''वतदागे''' नांवाची इमारत होय यांत शंका नाहीं. '''वर्तुलाकार बुद्धावशेष गृह''' असा या नांवाचा अर्थ आहे. नांवाप्रमाणें हें बांधकलाकाम वर्तुलाकार आहे. त्याचे एकावर एक चढते वर्तुलाकार असे प्रदक्षिणा मार्ग आहेत. पहिला वर्तुलाकार प्राकार छातीभर उंच असून त्याला उत्तरेस एकच प्रवेशद्वार आहे; मध्ये प्रदक्षिणेकरतां वाटोळा मार्ग आहे. याचे पुढचा प्राकार फारच कलाकौशल्याचा आहे. त्याला बरोबर चार दिशेला चार प्रवेशद्वारें असून, त्या प्रवेशद्वारांतून आंत जाण्याकरितां कठड्याच्या दगडी पायऱ्या आहेत. या पायऱ्या व{{nop}}<noinclude></noinclude>
qycsi2xu4xbhtzwjyzahlga08gb6sc8
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१२४
104
111958
236347
236290
2026-08-29T16:56:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236347
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 124 अनुराद्धपुर लोहप्रासादाचे दगडी खांब.jpg|center|borderless|अनुराद्धपुर लोहप्रासादाचे दगडी खांब]]
{{center|'''अनुराद्धपुर, लोहप्रासादाचे दगडी खांब.'''}}
{{rh|नं. १३||पान १०५}}
{{nop}}<noinclude></noinclude>
knvbf7kev0bw7jpxzwaiy1nuqo55hfi
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१३३
104
111969
236348
236313
2026-08-29T16:57:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236348
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

[[File:लंकेचे वर्णन व वृतांत pdf 133 अंबस्थले दागबा मिहिंतले.jpg|center|borderless|अंबस्थले दागबा मिहिंतले]]
{{center|'''अंबस्थले दागबा, मिहिंतले.'''}}
{{rh|नं. १४||पान ११२}}
{{nop}}<noinclude></noinclude>
bijzim1a5ggsqsmb9wrudozgwppvvm1
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५१
104
111987
236364
2026-08-30T11:47:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236364
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३० |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>तात. म्हणून या बाजूनें पुष्कळ यात्रेकरू शिखरावर चढतात. दुसरा मार्ग कोलंबोपासून रेल्वे- रस्त्यानें १०८ मैलांवर असलेल्या हॅटन गांवी आगगाडीनें जाऊन व तेथून मोटारीनें जाऊन शिखरावर पायीं चढणें हा होय. या मार्गानें जवळजवळ निम्मा चढ आगगाडीनें चढला जातो. माझ्या वयाकडे नजर देऊन मी या दुसऱ्या कमी दुर्गम मार्गानें जावयाचें ठरविलें; शिवाय या मार्गानें गेलें म्हणजे लंकेतील युरोपीयन लोकांनी घडवून आणलेली क्रांतिकारक सुधारणा- वनाचें '''बन''' बनविणें व माळाचे '''मळे''' बनविणें आपोआप व जातां जातां दृष्टीस पडतें. म्हणून हा मार्ग मी पसंत केला. ज्याप्रमाणें हिमालयांतील बद्रिकेदार, गंगोत्री, अमरनाथ वगैरे ठिकाणें पहाण्यास ठराविक काळींच जावें लागतें, त्याप्रमाणे या शिखरावरही ठराविक काळांत जावें लागतें. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत शिखरावर चढणें शक्य आहे. बौद्धधर्माप्रमाणें पौर्णिमा हा खरा पर्वणीचा दिवस. त्या रात्रीं यात्रेकरू शिखरावर चढू लागतात व पहांटेस वर पोहचतात. या चार पौर्णिमांस पुष्कळ बुद्ध यात्रेकरू दूरदूरच्या ठिकाणांहून येतात.
{{gap}}जानेवारी ३० सन १९३४ हा पौर्णिमेचा दिवस होता. म्हणून मी कोलंबोहून ता. २८ जानेवारी रविवार रोजी दोन प्रहरच्या तीन वाजतांच्या आगगाडीनें पेरेडॅनीयास जाण्याकरितां निघालों. कोलंबोपासून कँडी या सुंदर रेल्वे-रस्त्याचें व घाटाचें मी मागें वर्णन दिलें आहे. त्याची पुनरुक्ति करण्याचें कारण नाहीं. मला मात्र या रस्त्यानें जातांना चिरपरिचित नसला तरी एकदां परिचित प्रवासाचा व निसर्गरमणीय प्रदेशाच्या पुनर्दर्शनाचा लाभ झाल्यामुळे फार आनंद वाटला. अर्थात् मी माझ्या नव्या मित्राकडे रा. कंदया यांजकडे उतरण्यास गेलों. दुसऱ्या दिवशीं उंच चढाव चढून जातां यावें म्हणून मी एक दिवस विश्रांति घेतली. त्या दिवशीं मी पेरेडॅनिया बागेत फेरफटका करून आलों हें सांगावयास नकोच. ही बाग पाहून मला दीड महिना होऊन गेला होता. पूर्वीपेक्षां यावेळी बाग जास्तच सुंदर दिसूं लागली होती. कारण त्यावेळी<noinclude></noinclude>
27hcm10spmon8jtzisy0th6r24rrs1a
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५२
104
111988
236365
2026-08-30T11:51:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236365
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||श्रीपाद शिखर|१३१ }}</noinclude>झाडांना फारशी फुलं नव्हती पण आतां वृक्षवेलींना नवी पालवी व फुलें येऊ लागली होती. त्यामुळे वृक्ष वेली सतेज दिसूं लागल्या होत्या. मागच्या खेपस पाहिलेलें साधें एक रंगी वस्त्र बदलून सृष्टिसुंदरीनें दुसरें नानारंगी वस्त्र परिधान केलें आहे व बाहेर जाण्याकरितां नवा बुट्टीदार तांबूस रंगी शेला अंगावर पांघरला आहे असा मला भास झाला.
{{gap}}ता. २९ रोजी सकाळच्या सव्वा नवाच्या आगगाडीनें मी रा. कंदिया यांचा निरोप घेऊन हॅटन गांवीं जाण्यास निघालों. पेरेडॅनियाबागेच्या स्टेशनपासून हॅटन सदतीस मैल आहे. हा सर्व रेलवे रस्ता चढावाचा आहे. कारण पेरेडॅनिया बागेची समुद्रसपाटीपासून सुमारें सोळाशें फुट उंची आहे, तर हॅटनची चार हजार फूट उंची आहे. '''गांपोला, उपलाने व नवलपिटिया''' या स्टेशनपर्यंत रेल्वे-रस्ता उंच सखल व डोंगराळ मुलुखांतून जातो खरा; पण उंची फारशी वाढत नाहीं. या भागांत सखल जागेत भातशेती व चढत्या जागेत '''घाटाची भातशेती''' (Terraced cultivation ) बरीच आहे. जिकडे तिकडे हिरवी हिरवीगार शेतें दिसलीं. कारण हा भाताच्या दुसऱ्या पिकाचा हंगाम होता. जरा उंचवट्याच्या व मुरमाड जागेंत नारळी- पोफळी- केळीच्या बागा लागल्या. नवलपिटिया हे लंकेंतील अत्यंत पावसाचें ठिकाण होय. रत्नपुर गांवाप्रमाणे या गांवची डोंगरांनी जणूं एक कोंडी बनविली आहे. यामुळें येथें पाऊस पुष्कळ पडत असावा असें प्रवाशास ताबडतोब दिसून येतें. मार्गदर्शक पुस्तकावरून येथें वर्षांत दीड इंचाच्यावर पाऊस पडतो व वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसांपैकीं दोनशे बारा दिवस- सुमारें दोन तृतीयांश वर्ष- पावसाळी असतात असें कळलें. येथून मात्र चढावयास प्रारंभ होतो व पिकाचें स्वरूपही बदलतें. आतां सर्व डोंगर, माळ व दऱ्याखोरीं हीं चहाच्या झुडुपांनीं भरलेलीं असून हिरवी हिरवीगार दिसतात. चहाचें झुडूप आपल्या इकडल्या तगरी मोगरीच्या झुडूपासारखें दुरून दिसतें. त्याचीं पाने काळसर हिरवी पण तजेलदार असतात व त्या झुडूपाला खूप व बारक्या बारक्या खांद्या असतात. हें झाड न खडतां वाढविलें तर बरेंच<noinclude></noinclude>
bm5evxwctos9gpcaoj0t5av533cg1qz
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५३
104
111989
236366
2026-08-30T11:54:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236366
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३२ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>उंच व मोठें होतें. पण मग त्यापासून चहा तयार करतां येत नाहीं. त्याला जितक्या बारक्या खांद्या फुटतील, तितकें चांगलें. कारण चहाच्या झुडूपाचीं सर्व पानें चहा करण्यास उपयोगी पडत नाहींत; तर नव्या डिकशीची दोन पानें व न उमललेलें कळीसारखें एक पान येवढ्याच पानांचा चहा बनूं शकतो. म्हणून चहाच्या झाडाला उंच नीटस, सरळ वाढूच देत नाहीत; म्हणजे त्याचें नाना खांद्याचें ठेगणें झुडूप बनतें व मग त्याला आपल्या तुळशीच्या झाडाप्रमाणे हव्या तितक्या कोवळ्या डिकशा येतात. त्या खुडून त्याचा चहा बनवितात. नवलपिटियापर्यंत महावेली-गंगा नदी आपल्या डाव्या हाताला असते. नवलपिटीया स्टेशनच्या पुढें महावेली गंगेवरील सुंदर लोखंडी पूल आगगाडीने ओलांडल्यावर ती नदी आपल्या उजव्या हातास येते. साधारणतः हा रेलवे रस्ता या नदीच्या डाव्या उजव्या बाजूनें जातो; व नदीचीं विलक्षण रूपें आपल्यास पहावयास सांपडतात. केव्हां नदी फार खडकाळ व चिंचोळ्या चिळणीतून फेसाळलेल्या शुभ्र पाण्याच्या लोंढ्यानिशीं खळखळ असा मोठा आवाज करीत वहात जाते; तर कोठें ती रुंद होऊन सावकाश, संथपणें व गढूळ पाण्याच्या प्रवाहाने वहात जाते. नदीच्या बाजूस कोठें काळे काळे भोर खडक दिसतात; तर कोठें दाट व उंच अशी रबरवृक्षांची बनेंच्या बनें दृष्टीस पडतात; तर कोठें नदीच्या पाण्यापर्यंत पसरलेले चहाचे मळेच्या मळे दिसतात.
{{gap}}चहाच्या मळ्यांत मधून मधून सिलव्हर ओक हीं बारिक पानाची पण उंच वाढणारी झाडें सांवलीकरितां लावलेलीं दृष्टीस पडतात; एक रांग या उंच वृक्षांची तर दुसरी रांग कमी उंच वाढणाऱ्या पण जाड पानांच्या '''दडब''' नांवाच्या झाडाची असते. चहाच्या मळ्याची रचना अशी मोठी मजेची असते. पण मळा हा शब्द चहाच्या लागवडीस लावणें बरोबर नाहीं. कारण मळ्याप्रमाणें चहाच्या पिकाला कुंपण लागत नाहीं; त्याला सपाट जमीन लागत नाहीं; त्याला पाणी देण्याकरितां आळीं करावी लागत नाहींत; किंवा पाण्याचे<noinclude></noinclude>
l13o7js4ad37jjkf6zfh4qc8l6re5mn
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१५४
104
111990
236367
2026-08-30T11:58:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236367
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||श्रीपाद शिखर|१३३ }}</noinclude>पाट लागत नाहींत. खरोखरी चहाचें झुडूप हे आपल्या इकडल्या करवंदीप्रमाणे मोठें राकट व चिवट आहे; त्याचीं पानें गुरें खात नाहीत; तें हव्या तसल्या जागेवर उगवतें व वाढतें; जागा सखल असो, उंचवट्याची असो, घसरंडीची असो किंवा खोलगट असो, अशा सर्व ठिकाणी हीं झुडपें वाढतात; जास्त पावसाचे पाणी निघून जाण्याकरितां मधून मधून खोल चर खणलेले असतात. झुडुपांच्या डिकशा हातांनीं व नखांनी खुडता यांच्या म्हणून मजूरांना जाण्यासाठी सर्व डोंगरभर पाऊल वाट केलेली असते. हिरवे हिरवेगार ते डोंगर व मधल्या त्या वळणवळणाच्या उंच-सखल तांबड्या तांबड्या पाऊलवाटा; मधून मधून सांवलीकरितां हारीने लावलेलीं तीं दर जातीची झाडें; सिलव्हर ओक झाडांचीं तीं एका बाजूस पांढरी तर दुसऱ्या बाजूस हिरवीं बारिक पाने व दडब झाडांचीं तीं पोपटी रंगी जाड पानें, चहाचीं तीं काळसर हिरवट पानें व तांबड्या जमीनींमधील ते चर; हा सर्व देखावा एकसमयावच्छेदेकरून पाहिला म्हणजे मनाला मोठा विस्मय वाटतो.
{{gap}}'''गालबोडा''' स्टेशन आलें कीं आगगाडी बरीच उंचावर येते व सभोंवार डोंगरच डोंगर दिसतात; येथून रस्ता मागें गेल्याप्रमाणें डोंगरांच्या आंत आंत जातो व मोठें थोरलें लंब अर्धवर्तुळाकार वळण घेऊन मग पुढे '''वाटावाला''' स्टेशनला येतो. डोंगर चढून वर आल्यापासून '''श्रीपाद-शिखर''' दिसूं लागतें तें सारखे दिसत राहतें. या सर्व डोंगराळ प्रदेशाची तें शिखर जणूं कांहीं सारखी टेहेळणीच करीत आहे असें वाटतें. वाटावाला स्टेशननंतर '''रोझेला''' म्हणून एक स्टेशन लागते. येथून हॅटन चार मैल आहे. हॅटनला मी दुपारी एक वाजतां पोहोंचलों. हॅटन हे बरेंच मोठें शहर असून तें समुद्रसपाटीपासून चार हजार फूट उंचीवर आहे. येथून सभोवारचा दूरवरचा देखावा मोठा सुंदर दिसतो. हिंदुस्थानांतील काय किंवा काश्मीरांतील काय डोंगराळ भागाची शोभा म्हणजे नुसत्या निर्जन जंगलाची शोभा होय. पण या भागांतील सर्व डोंगर चहाच्या व रबराच्या पिकानें व्यापलेले आहेत इतकेंच नाहीं तर मनुष्यांनी<noinclude></noinclude>
axln8nnmyjh2xfnuhgfi67ly3otzkn3