विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.17
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:सांगली आणि सांगलीकर.pdf
106
74682
236460
236395
2026-09-01T08:16:27Z
कल्पनाशक्ती
3813
236460
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सांगली आणि सांगलीकर
|Language=mr
|Volume=
|Author=अविनाश टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=सांगली नगरवाचनालय
|Address=सांगली
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 5="स्वागत" 13="लेखनामागील भूमिका" 17="प्रकाशकांचे मनोगत" 18="ऋणनिर्देश" 19="अनुक्रम" 20="महिमा सांगलीचा" 21="सांगलीचे आराध्य दैवत" 22="फोटो" 23="फोटो" 24="फोटो" 25="सांगली - एके काळची रम्य नगरी" 35 ="सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन" 46 ="महाराष्ट्राचा आद्य नाटककार विष्णुदास भावे" 55="नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल" 67="कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर" 79 ="संत कोटणीस महाराज" 91="आबासाहेब सांबारे" 101 ="साधुदास" 111 ="अुद्योगरत्न कै. दादासाहेब वेलणकर" 123="प्रो. ग. ह.रानडे" 131 ="कवि काव्यविहारी" 141="भालचंद्र म्हैसकर" 149="कै. हरि नाना पवार"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

1tnb7c3l7d0h53kqxqaswxzkv3cvgj8
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३१
104
77657
236431
202620
2026-08-31T16:10:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236431
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|{{x-larger|केशवसुतसंप्रदायाचे अध्वर्यू}}}}
{{center|{{xx-larger|कवि काव्यविहारी}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}बालगंर्धव आणि त्यांची गंधर्व संगीत मंडळी अवघा महाराष्ट्र दुमदुमून सोडत होती तेव्हाचा, म्हणजे १९१५-१६चा काळ. नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल हे नाटकाच्या तालमी घेत असत. पुण्यात नाटकाचे प्रयोग असल्याने त्यांचा मुक्काम पुण्यात कंपनीच्या बिऱ्हाडी होता. एक अुत्साही कॉलेजयुवक आपली कवितांची चोपडी घेऊन देवलाना भेटायला गेला. तिथे त्यावेळी राम गणेश गडकरीपण बसले होते. आपल्या एक दोन कविता त्या युवकाने देवलाना दाखविल्या. देवलांशी पूर्वपरिचय असल्याने तो युवक जरा जोशातच होता. 'इंद्रधनुष्य' आणि 'चंद्रोदय' या कवितांमधील काही पंक्ती अशा होत्या :

{{block center|<poem>'नीलवर्णनभसरः सलिलगत शतकमळे फुलली' आणि
‘अमररमणीपादतलहतहंस म्हणुनि विहरे गगनी हा '</poem>}}
{{gap}}बाणभट्टाच्या समासांची आठवण करुन देणारी भाषा बघून थोड्या रोषानेच देवल त्या युवकाला म्हणाले 'अरे बंडू, तू मराठी कविता लिहितोस की संस्कृत ? मराठी कविता लिहायची तर सोप्या, सुबोध भाषेत लिहीत जा.” नंतर जवळ बसलेल्या गडकऱ्याना ते म्हणाले, "कवितेच्या नादी लागून तुम्ही कॉलेज सोडलंत, तसंच हा मुलगाही कॉलेज सोडेल अशी मला भीती वाटते.” आणि मग त्या युवकाला समजावत ते म्हणाले “हे बघ, कविता लिहायची तर सर्वाना समजेल अशी लिही आणि हो, ही कवितेची वही माझ्याकडेच राहू दे. बी.ए. होईपर्यंत कविता करायच्या नाहीत."

{{gap}}हा युवक म्हणजेच कै. धोंडो वासुदेव गद्रे तथा 'कवि काव्यविहारी.' नाट्याचार्य देवलांची शिकवणूक आयुष्यभर त्यानी लक्षात ठेवली. त्यामुळे सुबोधता हा त्यांच्या कवितेचा ठळक विशेष बनला.

{{gap}}'काव्यविहारी' ना केशवसुत संप्रदायाचे प्रमुख कवि म्हणून ओळखले जाते. त्याना स्वतःला तसा त्याचा रास्त अभिमान होता. त्यांची केशवसुतांसारखी समाजसुधारणेची कळकळ, 'काव्यविहार' या कवितासंग्रहातील 'सवाल' सारख्या कवितांमध्ये प्रकर्षाने<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..............................१०७</noinclude>
d339aiv6c3a4qprt8t96fn2gdvk3wc0
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३२
104
77658
236432
202621
2026-08-31T16:17:58Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236432
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>प्रकट झाली आहे. आचार्य अत्रे, कवि मायदेव हे त्यांचे फर्ग्युसनमधील समकालीन कविमित्र. तिघेही बरोबरीने काव्यरचना करीत. कॉलेजच्या मासिकात पाठवत. आचार्य अत्र्यानी आयुष्यात अनेक माणसे जोडली आणि तोडली पण. मात्र काव्यविहारींशी तरूणपणी जडलेला स्नेह अत्र्यानी आयुष्यभर जपला. काव्यविहारींच्या सत्तरीच्या समारंभाच्या निमित्ताने आपल्या 'मराठा' मध्ये लिहिलेल्या लेखात त्यानी म्हटलय “कविवर्य गोविंदग्रजांच्या मृत्यूनंतर (जानेवारी १९१९) आणि रविकिरण मंडळाच्या अुदयापूर्वीचा (१९२३) संधिकाळ, ज्या काही कवींनी आपल्या प्रतिभाबलाने गाजवला, त्यात काव्यविहारींचा प्रामुख्याने अल्लेख केला पाहिजे. सामाजिक बंडखोरी आणि राष्ट्रीय अुत्थापन या केशवसुतांच्या दोन वैशिष्ट्यांचे, काव्यविहारीनी यथाशक्ति निष्ठेने अनुकरण केले. सुबोध धावती रचना, राष्ट्रीय भावनेची चेतावणी, जोरकस विचारांचा प्रवाह हे काव्यविहारींच्या काव्याचे अुल्लेखनीय विशेष होत." आचार्य अत्रेंची गुणग्राहकता आणि रसिकता सर्वश्रुतच आहे. त्यानी स्वतः पुढाकार घेऊन काव्यविहारींचा “स्फूर्तिलहरी” हा काव्यसंग्रह, स्वतःच्या अध्यक्षतेखाली, त्यांच्या एकूण खाक्याप्रमाणे, टोलेजंग समारंभ आयोजून प्रकाशित केला होता.

{{gap}}आचार्य अत्र्यांसारख्या प्रचंड व्यक्तिमत्वाच्या महापुरूषाने, ज्याना गौरविले ते 'काव्यविहारी', आता काळाच्या पडद्याआड गेले असले तरी काव्यप्रेमी सांगलीकरांच्या मनात त्याना अढळ स्थान आहे.

{{gap}}अशा रसिकमान्य काव्यविहारींचा जन्म सांगलीजवळील हरिपूर गावचा. १५ नोव्हेंबर १८९४ सालचा. नाटककार देवलांचा जन्म पण हरिपूरचाच. कृष्णा- वारणेच्या संगमावरील श्रीसंगमेश्वराचे प्राचीन मंदिर, त्याभोवतीचा निसर्गरम्य परिसर अशा वातावरणात काव्यविहारींचे बालपण गेले. आज कल्पना येणार नाही इतके त्या काळात हरीपूर रम्य ठिकाण होते. नदीच्या प्रवाहात तास न् तास पोहावे. नदीकाठच्या मळ्यातील कोवळी कोवळी मक्याची कणसं, बाजीरावाच्या थाटात खावीत. शेजारच्या सुप्रसिद्ध गणपती बागेतील चिंचेच्या घनदाट बनात शिरून चिंचा, बोरे, कवठे असा खुराक खात, मजेत हुंदडावे असे रम्य बालपण त्याना लाभले. सुदैवाने नाटककार देवलांचा मुक्काम काव्यविहारींच्या बालपणी बरेचदा हरिपुरात असे. त्यांचा सहवास मिळायचा. त्यांचे जेवणखाण काव्यविहारींच्या घरातच होत असल्याने त्यांच्या गप्पा ऐकायला मिळत. या वातावरणामुळे त्यांच्या ठिकाणी नंतर वाढीस लागलेल्या निसर्गप्रेमाची आणि काव्यप्रेमाची हातात हात घालून जडणघडण झाली. पुढे न्यायखात्याची रूक्ष नोकरी इमानेइतबारे करताना, कामाच्या निमित्ताने पंढरपूरजवळील निसर्गरम्य 'खंडाळी' येथे त्याना राहण्याचा योग येई, तेव्हा त्यांचे काव्यप्रेम आणि निसर्गप्रेम फाळून येई. त्याचे बीज या हरिपूरच्या बालपणातच रुजलेले होते.{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..........................१०८</noinclude>
3nsucbkxm2xqpqnnbbk5cxsk2d0i7s6
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३३
104
77659
236433
202622
2026-08-31T16:26:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236433
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}असे सकृतदर्शनी सुखदायक वातावरण होते तरी व्यावहारिक दृष्ट्या त्यांचे बालपण कष्टात गेले. ते अवघे पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे प्लेगने निधन झाले. घरात आई आणि सदा व नाना ही दोन धाकटी भावंडे होती. सुदैवाने स्वतःचे घर होते आणि मुख्य म्हणजे आईच्या मनगटात जोर होता. जिवापाड कष्ट करण्याची हिंमत होती. त्यांच्या चुलत चुलत्यानी या निराधार कुटुंबाला आधार दिला.

{{gap}}काव्यविहारींचे प्राथमिक शिक्षण हरिपुरात झाले. दुय्यम शिक्षणाची सोय नसल्याने त्याना जवळच्या सांगलीत पायपीट करत हायस्कूलसाठी जावे लागे. त्यावेळचे सांगली हायस्कूल आताच्या आमराईच्या बाजूला नव्हते तर सध्याची कोर्ट भरतात त्या ठिकाणी होते. शाळेत ते हुषार विद्यार्थी म्हणून गणले जात. १९११साली ते 'स्कूल फायनल' पास झाले. त्या काळात तेवढ्या 'क्वालिफिकेशन' वर नोकरी मिळणे शक्य होते. घरच्या परिस्थितीमुळे काव्यविहारी नोकरीच्या खटपटीलाही लागले होते. मात्र एवढ्या हुशार विद्यार्थ्याने, एवढ्या लहान वयात नोकरीला लागावे ही गोष्ट, त्यावेळचे सांगली हायस्कूलचे मुख्याध्यापक वासुनाना खाडिलकर आणि देवधरशास्त्री याना पटेना. पुढील शिक्षणाचे मार्ग मोकळे व्हावेत, म्हणून त्या अुभयतानी काव्यविहारीना एक वर्ष अभ्यास करून मॅट्रिकला बसण्याचा आग्रह केला, त्यानुसार १९१२ साली ते चांगल्या मार्कानी मॅट्रिक झाले. घरच्या गरिबीमुळे कॉलेजशिक्षणाचे स्वप्नही ते पाहू शकले नसते. पण अशा वेळी बुधगाव संस्थानचे अधिपती कै. बाबासाहेब पटवर्धन देवासारखे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एक हुशार व होतकरु मुलगा म्हणून त्यानी काव्यविहारीना कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून ते थेट एल.एल.बी.पूर्ण होईपर्यंत स्कॉलरशिप दिली. या बहुमोल ऋणाचा काव्यविहारीना कधीच विसर पडला नाही. एरवी वकिलीच्या धंद्यात त्याना अमाप पैसा मिळविता आला असता. स्वतंत्र वृत्तीने राहता आले असते. पण तो काळ आणि त्या काळातील लोकांच्या निष्ठा खणखणीत होत्या. ज्यानी आपले शिक्षण पूर्ण केले त्या राजेसाहेबांशी काव्यविहारी कधीहि बेईमान झाले नाहीत बुधगावसारख्या आडगावात स्वतःला कोंडून, नोकरीची सर्व बंधने स्वीकारून त्यानी शेवटपर्यंत निष्ठेने नोकरी केली.

{{gap}}१९१३ व १९१४ ही दोन वर्षे ते कोल्हापूरला राजाराम कॉलेजात होते. इंटर झाल्यावर बी.ए.च्या अभ्यासासाठी जानेवारी १९१५ मध्ये ते पुण्याला फर्ग्युसनमध्ये गेले. १९१७ साली बी. ए. झाल्यावर मुंबईस दोन वर्षे राहून, त्यानी एल.एल.बी. पूर्ण केले आणि तडक बुधगावकरांच्या संस्थानी सेवेत ते रूजू झाले. मामलेदार म्हणून नोकरीची सुरवात करून विविध पदांवर कामे करून १९४८ साली बुधगाव संस्थान खालसा व्हायच्या वेळी ते संस्थानचे प्रमुख न्यायाधीश बनले होते. दोन-चार वर्षे आधीच निवृत्ती घेऊन, त्यानी सांगलीत कायमस्वरूपी वास्तव्य केले, ते १९७५ साली<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................१०९</noinclude>
511ec2629cnmipugr1sh2vcctv44m5s
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३४
104
77660
236434
202623
2026-08-31T16:30:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236434
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अखेरच्या सोडलेल्या श्वासापर्यंत.

{{gap}}१९११ साली त्यांच्या वाङ्मयीन जीवनाला सुरुवात झाली. बालपणीच म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षापासून तो दहाव्या वर्षापर्यंत, त्याना नाट्याचार्य देवलांचा सहवास घडला. संगमेश्वराच्या देवळात सांज-सकाळ होणारा घंटानाद, वेदशास्त्रसंपन्न ब्राम्हणांच्या घराघरातून ऐकू येणारा मंत्रघोष, या वातावरणाचे संस्कार देवलाना जिथे मोहवून गेले, त्या हरिपुरात काव्यविहारी नक्कीच प्रभावित झालेले असणार. त्याच काळात सुप्रसिद्ध लेखक ना. ह. आपटे हरिपुरात येत असत. त्यांच्या कथा- कादंबऱ्यांची विलक्षण मोहिनी काव्यविहारींच्या बालमनावर पडली होती. इतकी की त्यानी तोरो नावाच्या (पुढे अध्यात्माच्या मार्गाने कालक्रमणा करणारे सांगली शिक्षण संस्थेचे एक संस्थापक सदस्य, गुरुनाथ तोरो) मित्राच्या मदतीने 'कलियुग' नावाच्या कादंबरीचा आराखडासुद्धा तयार केला होता. त्या संदर्भात पत्ते खेळणाऱ्या चुलत- चुलत्यांची व त्यांच्या मित्रांची नावे जशीच्या तशी या कादंबरीच्या हस्तलिखितात आली होती. (निदान नावे बदलून लिहावे हा पोच बालवयात कसा असणार?) आणि वस्तुस्थिती अशी होती की ही मंडळी मौजेखातर खरोखरच दोन-चार पैसे लावून खेळत असत. झाले. वडिलधाऱ्यांच्या हाती ते कागद पडल्यावर काय झाले असेल ते सांगायला नकोच. काव्यविहारींची तीच पहिली आणि अखेरची कादंबरी!

{{gap}}लहानपणी नाटकं बघितल्यावर, आणि देवलांशी गप्पागोष्टी झाल्यावर, नाटकातील चालींवर पदे किंवा मुखडे रचण्याचा त्याना नाद लागला. त्यानी खरी कविता अशी लिहिली, ती घरातील अंगणातच टवटवीत फुललेल्या जाईच्या वेलीवरील फुलाला उद्देशून. घरातच राहणाऱ्या देवलाना त्यानी ती दाखविली. देवलांना आवडली. त्यानी ‘आनंद’ मासिकाच्या वासुदेवराव आपटे यांजकडे पाठवली. (पुढे कॉलेजात गेल्यावर मात्र बी.ए. होईपर्यंत कविता न करण्याचा खरमरीत सल्ला देवलानी दिला. पण काव्यविहारीना तो मानवला नाही ही गोष्ट वेगळी.) 'आनंद' मासिकात 'फुलाची विनंती' म्हणून आलेली काव्यविहारींची हीच पहिली कविता. राजाराम कॉलेजात असताना त्यानी काही कविता केल्या. कॉलेजच्या मासिकात छापून आल्या. पण त्यांच्या खऱ्याखुऱ्या वाङ्मयीन जीवनाला सुरुवात झाली ती पुण्याला फर्ग्युसन कॉलेजात दाखल झाल्यानंतरच. त्या काळात पुण्यात नुसता रहिवासी म्हणून राहण्यासारखे आणि त्यातून फर्ग्युसनचा विद्यार्थी असण्यासारखे दुसरे भाग्य नव्हते. लोकमान्य टिळकानी आणि त्यांच्या केसरीने राजकीय वातावरण भारून टाकले होते. देवल- खाडिलकरांची नाटके, गंधर्व मंडळी रात्र रात्र रंगवीत होती. फर्ग्युसनमध्ये रँग्लर परांजपे, भाटे, रा.द.रानडे (पुढील काळातील गुरुदेव रानडे) यासारखी विद्वान मंडळी होती. प्रा. पटवर्धनांसारख्या रसिक प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली, काव्यविहारीना<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................११०</noinclude>
9latlvorhs5b51lmdj8sda11meu8f5e
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३५
104
77661
236435
202627
2026-08-31T16:34:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236435
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>इंग्रजीमधील अुत्तमोत्तम काव्याचा, तसेच केशवसुतांच्या काव्याचाही, सखोल अभ्यास करता आला. तो त्याना भावी आयुष्यात फार फलदायी झाला. आचार्य अत्रे, कवी मायदेव यासारखे सहाध्यायी कॉलेजात होते. अशा परिस्थितीत काव्यविहारींच्या प्रतिभेला धुमारे फुटले नसते तरच नवल! अत्रे, मायदेवांच्या बरोबर ईष्येंने काव्यरचना करण्यात त्याना धन्यता वाटत होती.

{{gap}}त्या काळी 'मनोरंजन' नावाचे मासिक होते. १९०० ते १९२० या काळात महाराष्ट्रात ललित वाङ्मयाबद्दल आवड व अभिरूची निर्माण करण्याचे मोठेच काम या मासिकाने केले. या मासिकाच्या पहिल्या पानावर कविता प्रसिद्ध होणे हे फार प्रतिष्ठेचे समजले जाई. गोविंदाग्रज, बालकवी, रेव्ह. टिळक अशा दिग्गजांच्या कवितानांच तेथे स्थान मिळे. अशा परिस्थितीत 'हसणारी कलिका' ही आपली कविता 'मनोरंजनच्या ' पहिल्याच पानावर आलेली बघून, काव्यविहारीना केवढा परमावधीचा आनंद झाला असेल! त्याच अुर्मीत त्यानी 'कृष्णाकाठी' (या कवितेचा गौरवपूर्वक अुल्लेख सांगलीमधील जुन्या स्टेशन चौकातील जाहीर सभेत यशवंतराव चव्हाण यानी केला होता.) 'आशानिराशा' व ‘तरंग' या कविता पाठविल्या आणि त्यांचेहि स्वागत झाले. सुरुवातीच्या काळात काव्यविहारींच्या कविता, प्रेम आणि प्रेमभंग, यासंबंधीच्या असत. याच संदर्भात आपल्या, ‘माझे वाङ्मयीन जीवन' या आत्मनिवेदनपर पुस्तकात त्यानी म्हटलं आहे की 'एका दूरस्थ तारकेचा ध्यास' त्याना काव्यप्रवण बनवत होता. गंमतीची गोष्ट म्हणजे प्रेमाच्या कविता लिहिताना त्या कविता डी.व्ही. गद्रे या रूक्ष नावाने प्रसिद्ध होत होत्या! ('काव्यविहारी' हे नाव साहित्याशी तसा संबंध नसणाऱ्या त्यांच्या एका मित्राने नंतर सुचविले) पुढे केशवसुतांच्या काव्याच्या अभ्यासामुळे, तसेच प्रा. वासुदेवराव पटवर्धन यांच्या प्रभावाने काव्यविहारी, आगरकरी संप्रदायाकडे व समाजसुधारणेकडे वळले. प्रेमकविता आपोआपच लोप पावली आणि तिची जागा सामाजिक कवितेने घेतली.

{{gap}}एल.एल.बी.साठी मुंबईत केलेल्या अभ्यासाच्या वास्तव्यात, त्यांचा 'अुद्यान' आणि 'नवयुग' या मासिकांशी संबंध आला. त्या मासिकातून त्यांच्या कविता येऊ लागल्या. बुधगावात, एल. एल. बी. पूर्ण करुन आल्यानंतर मात्र, त्यांची वैचारिक कुचंबणा होऊ लागली. एक तर पुण्या-मुंबईत जे मोकळे वातावरण अनुभवायला मिळायचे त्याचा लोप झाला. बुधगावसारख्या आडगावात काही वाचायला मिळायचं नाही. त्या काळात आजच्यासारखी सुलभ वाहतूक व्यवस्था नव्हती म्हणून ४-५ मैलांवरच असलेल्या सांगलीस येणे पण जमायचं नाही. आणि या सर्वात जिकिरीचे काम म्हणजे संस्थानची नोकरी! म्हणजे तोंड असून बोलायचे नाही. कान असून ऐकायचे नाही, असा प्रकार! त्यातून काव्यविहारींसारखी त्या काळातील माणसं<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..................................१११</noinclude>
p353d3drhgxxcu11bhts671102c18wm
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३६
104
77662
236436
202628
2026-08-31T16:40:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236436
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>म्हणजे नोकरीसुध्दा कठोर व्रतासारखी करणारी. अत्यंत कर्तव्यतत्पर आणि कर्तव्यकठोर. आपलं काव्य, आपल्या आवडीनिवडी, त्यानी संस्थानी नियमांच्या आड कधीच येऊ दिल्या नाहीत. ते म्हणायचे "मी प्रथम संस्थानचा नोकर, मग कवी. तो सुद्धा बुधगावच्या हद्दीबाहेर."

{{gap}}पण सुदैवाने नोकरीच्या सुरुवातीच्या काळातच त्याना अचानक एका 'ओॲसिसचा' लाभ झाला. त्याचं असं झालं :-

{{gap}}त्यांची नोकरी १९१९ साली सुरु झाली. त्याच सुमारास सांगलीतील विलिंग्डन कॉलेज सुरु झालं. १९२१ साली ऐच्छिक भाषा म्हणून मुंबई विद्यापीठाने मराठीला स्थान दिले. कॉलेजात मराठी शिकवायला कोणी योग्य माणूस मिळेना म्हणून विलिंग्डनचे प्रिन्सिपॉल भाटे स्वतः बुधगावला काव्यविहारींकडे गेले. म्हणाले की, “मी गद्य विभागाकडे बघतो. तुम्ही पद्यविभाग शिकवा." एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर बुधगावच्या राजेसाहेबाना भेटून त्यांची रीतसर परवानगी काढून आले. अशा रीतीने संस्थानी नोकरी सांभाळून १९२२ ते १९२५ या काळात, मराठीचे प्राध्यापक म्हणून काव्यविहारीनी अध्यापन केले. आपल्याला जमेल का नाही अशा संभ्रमात असलेले काव्यविहारी, नंतर मात्र या कामात रमून गेले. त्या निमित्ताने जुन्या-नव्या काव्याचा अभ्यास करायला मिळाला याचाच आनंद त्याना फार झाला.

{{gap}}संस्थानी राजवटीच्या आणि पारतंत्र्याच्या काळामुळे त्यांची कविता काही प्रमाणात कठोर, रुपकात्मक व थोडी साम्यवादी बनली. 'स्फूर्तिलहरी' मधील ‘हरिणीप्रत,' ‘अुंबरातले किडे,' पाळीव पोपटास', 'मैना' तर 'स्फूर्तिनिनाद' मधील बांडगुळे, दिवाभीते, काजवे या कविता तशा धाटणीच्या बनल्या आहेत. “अुंबरातले किडे” ही त्यांची गाजलेली कविता, ब्रिटीशानी पारतंत्र्याच्या काळात ऐदी बनवलेल्या, संस्थानिकांस चांगलाच चिमटा काढून गेली. वानगीदाखल या काव्यपंक्ती पहा;

{{block center|<poem>"अुंबरात बांधुनि वाडे
अुंबरी नांदती किडे
राजा झाला कुणी एकला
दुजा गाजवी प्रधानकीला
तिसरा जागे रखवालीला
प्रजा बनोनी अवती भवती
असंख्य जमती किडे"</poem>}}
{{gap}}परतंत्र हिंदुस्थान आणि ब्रिटिश सरकार यांच्या संदर्भातील 'पाळीव पोपटास' ही रूपकात्मक कविता त्या काळी फारच प्रक्षोभक ठरली. 'केसरी' सारख्या प्रमुख<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...................११२</noinclude>
tjutwvl4cj0ipc5gpijn6me54zd33kr
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३७
104
77663
236437
202629
2026-08-31T16:43:53Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236437
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>वृत्तपत्रात या कवितेला ठळकपणे प्रसिद्धी मिळाल्याने ती कविता फार गाजली. आणि "हे डाळिंबाचे दाणे वेड्या, घात तुझा करिती" या काव्यपंक्ती सर्वतोमुखी झाल्या. अर्थात् अपेक्षेप्रमाणे ही प्रसिध्दी राजेसाहेबांच्या कानी जाऊन, काव्यविहारीना खुलासा विचारला गेला. तेव्हा "ब्रिटिशानी विचारलं तर अुत्तर देण्यास मी समर्थ आहे. फार तर त्यावेळी तुम्ही मला संरक्षण देऊ नका म्हणजे झालं" असं तडाखेबंद अुत्तर काव्यविहारीनी दिलं! ब्रिटिशांची अवकृपेची तशी वेळ आली नाही. याचं एक कारण म्हणजे शब्दात न सापडण्याचं कायद्याचं ज्ञान त्याना अुपयोगी पडलं असावं.

{{gap}}स्वातंत्र्याच्या चळवळीचा तो काळ होता. अनेक लढे, आंदोलने, सत्याग्रह यांची सर्वत्र धामधूम माजली होती. काव्यविहारींच्या अनेक कवितांमधून त्यांचे स्वदेशप्रेम व्यक्त होत होते. १९४२च्या आंदोलनात, काँग्रेसच्या बुलेटिन्समध्ये, त्यांच्या अनेक कविता अद्धृत केल्या जात. अशा कवितांची अुदाहरणे विस्तारभयास्तव देता येत नाहीत. तरीपण त्यांच्या 'पायरीवर' या कवितेचा अुल्लेख केलाच पाहिजे. क्रांतिप्रवण स्वातंत्र्यसैनिकाच्या भूमिकेशी जुळणारी, त्यांच्या मनाची सहसंवेदना, त्यामध्ये व्यक्त झाली आहे.
{{block center|<poem>"किती वेळ तिष्ठतो येथे
अजुनि का बंद ते द्वार"</poem>}}
{{gap}}अशी सुरुवात असणाऱ्या त्या कवितेच्या शेवटच्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.
{{block center|<poem>“बंद जे द्वार हे पुढचे
आंतुनि न अुघडायाचे
करुनिया यत्न निकराचे"
आम्हीच पुढुनि 'फोडावे', तेधवा खुले होणार !”</poem>}}
{{gap}}यातील 'फोडावे' या शब्दाऐवजी 'खोलावे' असा सौम्य शब्द ठेवावा, असा एक विचार होता. पण 'फोडावे' हा शब्दच जोरकस आणि अर्थवाही असल्याने तोच ठेवावा, असा काव्यविहारी व ती कविता प्रसिद्ध करणारे 'किर्लोस्कर' चे धाडशी आणि धडाडीचे संपादक श्री. शंकरराव किर्लोस्कर यांचा निश्चय झाला. संभाव्य परिणामांची पूर्ण जाणीव ठेवून शं. वा. कि. एवढ्यावर थांबले नाहीत तर कवितेसोबत त्यानी एक चित्र काढले. एका मोठ्या कुलुप लावलेल्या दरवाज्यासमोर एक खेडूत हातात भला थोरला हातोडा घेऊन, हात अुगारून म्हणत आहे, "व्हाईसराया, दार अघडणार की नाही?” अशा आशयाचे ते व्यंगचित्र त्यानी स्वतःच काढले! सांगलीच्या दुसऱ्या सुपुत्राने म्हणजे वसंतदादांनी, या कवितेच्या प्रसिद्धीनंतर काही महिन्यातच तुरुंग फोडून पळण्याचा प्रयत्न केला होता! ही घटना बोलकी आहे. कवितेचा प्रभाव<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.................................११३</noinclude>
n2x1kb9fjy4gyjzw097s6eaevrkxgc8
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३८
104
77664
236438
202631
2026-08-31T17:00:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236438
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>खरोखरीच त्यांच्यावर पडला असावा, असं दर्शवणारी आहे.

{{gap}}“वेडी मुले” या कवितेत भारतमातेला अद्देशून काव्यविहारी म्हणतात.
{{block center|<poem>"परदास्याची बेडी होती पायी तव जेधवां
पुत्र शहाणे तुझे दंगले संसारी तेधवां
काही वेडी मुले तयांची भडकुनि गेली मने
क्रांतीपूजा केली त्यानी रुधिराच्या तर्पणे "</poem>}}
{{gap}}काव्यविहारी आचार-विचाराने आधुनिक होते. समाजविघातक रुढी, परंपरा आणि अंधश्रध्दा यांच्याविरूद्ध त्यानी पहिल्यापासून बंडच पुकारले. परमेश्वराविषयी श्रध्दा असली, तरी वाचनाने, अुच्च शिक्षणाने, त्यांचे मन दिसेल त्या शेंदूर फासलेल्या दगडाला, देव मानण्यास राजी झाले नाही. पण विश्वाचे नियंत्रण करणारी काही एक शक्ती निश्चित आहे आणि तिलाच परमेश्वर मानावे, अशी त्यांची धारणा खालील कवितेत व्यक्त होते.

{{block center|<poem>"व्यापोनिया विश्व स्वयंप्रकाशी
प्रकाशवी जो शशि- भास्करांसी
आणि निरोधी ग्रहमंडलासी
चैतन्य जगी स्फुरवी तो देव माझा "</poem>}}
{{gap}}बुधगावात जरी काव्यविहारी मिठाची गुळणी धरुन बसत तरी बाहेरगावी गेल्यावर, आपल्या काव्यगायनाच्या कार्यक्रमाने श्रोत्यांना जिंकून घेत. अलीकडे लोकप्रिय झालेली काव्यगायन-वाचनाची प्रथा एका परीने त्यानी सुरु केली असं म्हणायला हरकत नाही. काही कविता ते गात असत पण त्यांचा भर काव्यवाचनावर असे. ओजस्वी कविता, खडा आवाज, स्पष्ट पण लयबद्ध शब्दोच्चार, यामुळे त्यांचे काव्यवाचन फार परिणामकारक होई.

{{gap}}त्यांची एकूण सात पुस्तके, चार काव्यसंग्रह आणि तीन गद्य पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पहिला काव्यसंग्रह 'काव्यविहार' (१९२३) तर दुसरा आचार्य अत्रे यानी पुढाकार घेऊन प्रकाशित केलेला, आणि वि. स. खांडेकरानी प्रस्तावना लिहिलेला 'स्फूर्तिलहरी' १९३६ साली प्रसिध्द झाला. "दक्षिणा प्राईज कमिटी' ने या काव्यसंग्रहास पारितोषिक देऊन आणि मुंबई विद्यापीठाने एम. ए. परीक्षेसाठी नेमून त्याचा गौरव केला. त्यामुळे काव्यविहारीना तत्कालीन मराठी कवींमध्ये मानाचे स्थान मिळाले.

{{gap}}१९४८ साली संस्थान विलीन झाल्यावर, त्यानी मुदतीपूर्वीच सेवानिवृत्ती घेतली व ते सांगलीत स्थायिक झाले. साहित्य, नाट्य, काव्य, व संगीत इत्यादी सांस्कृतिक अपक्रमांचे माहेरघर असलेल्या, सांगलीत त्यांच्या साहित्यनिर्मितीला<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...............................११४</noinclude>
al1og4vfwzd2d4s6606c2a0q738vsi3
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१३९
104
77665
236439
202632
2026-08-31T17:23:36Z
कल्पनाशक्ती
3813
236439
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="Priyanka Choudhari" /></noinclude>पुन्हा चालना मिळाली. 'स्फूर्तिनिनाद' (१९५०) आणि 'स्फूर्तिविलास (१९५४) हे आणखी दोन काव्यसंग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. त्यांच्या एका नाट्यविषयक व्याख्यानाने प्रा. श्री. के क्षीरसागरांसारखा, रसिक समीक्षक, एवढा प्रभावित झाला की काव्यविहारीनी आपली नाट्यविषयक मौलिक माहिती रसिकांपर्यंत पोचवावी म्हणून गद्यलेखनाचा आग्रह त्यानी काव्यविहारींकडे धरला. त्यातूनच "नाट्यसुगंध' (१९६०) व ‘नाटककार देवल-व्यक्ति आणि वाङमय' (१९६३) अशी त्यांची दोन पुस्तके सिद्ध झाली. श्री.के.क्षींच्याच आग्रहावरून त्यानी 'माझे वाङ्मयीन जीवन' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले.

{{gap}}काव्यविहारीना आपले आत्मचरित्र काव्यात गुंफायची फार अिच्छा होती. ६ सप्टेंबर १९६१ ते २७ सप्टेंबर १९६१, या २१ दिवसात "जीवनदर्शन-आत्मचरित्रपर खंडकाव्य,” दररोज सलग चार तास 'सविकल्प समाधी'त बैठक ठोकून, मोठ्या तन्मयतेने त्यानी लिहून पूर्ण केले. अर्थात् त्यामध्ये १९६१-६२ पर्यंतचाच काळ आला आहे. या खंडकाव्याची चरणसंख्या ४६१८ आहे. दुर्दैवाने हे खंडकाव्य अद्यापपावेतो अप्रकाशित राहिले आहे. प्रसिद्ध झाले असते, तर पद्यात्मक आत्मचरित्र म्हणून, मराठी साहित्यात गौरवाचे स्थान त्याला निश्चित प्राप्त झाले असते. कारण मराठीत गद्य आत्मचरित्रांचे अदंड पीक आलेले असले, तरी पद्यात्मक आत्मचरित्र, हा अत्यंत दुर्लभ प्रकार आहे. हे आत्मचरित्र एका अर्थी अपुरे असले, तरी बऱ्याच अर्थी पूर्ण झालेले आहे. याचे कारण असे की काव्यशास्त्रविनोदात रममाण होऊन सुखाने वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करत असेपर्यंतचा सगळा भाग या चरित्रात आला आहे.पुढे एका सायकलची धडक बसून त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. त्यातच त्याना अर्धांगाचा झटका आला. नंतर त्यांची प्रकृती थोडी सुधारली पण लेखन मात्र बरंचसं थंडावलं. १९७१-७२ मध्ये घरीच कॉटवरून पडून त्यांच्या मांडीचे हाड मोडले आणि ते पूर्णपणाने आंथरुणाला खिळले. अखेर २२ जानेवारी १९७५ रोजी ते शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन झाले! शेवटच्या विकलांग अवस्थेतसुध्दा त्यांनी मनाची शांति व चेहेऱ्यावरची प्रसन्नता आश्चर्यकारकपणे जपली होती.

{{gap}}असं म्हणण्याचं कारण अितकचं की तसे ते मनमोकळ्या स्वभावाचे व मित्रांच्या मोठ्या कळपात वावरणारे नव्हते. न्यायखात्याच्या नोकरीमुळे असेल कदाचित्, पण तर्ककर्कश आणि कतर्व्यकठोर होते. त्यांची कवयित्री कन्या, सौ. विमल काळे यानी एके ठिकाणी म्हटलय " तसे आप्पा (काव्यविहारी) थोडे रागीट, एककल्ली, स्पष्टवक्ते आणि तऱ्हेवाईक म्हणून प्रसिध्द होते.......त्याना बुधगावात एकही जिव्हाळ्याचा मित्र नव्हता......त्यांची कामातली शिस्त, वेळेच्या बाबतीतला काटेकोरपणा आणि निःस्पृहता यामुळे राजेसाहेबांसकट, सर्वजण त्याना वचकून असत." हे मुद्दाम
<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................... ११५</noinclude>
1idxsvekjnpkjlqr1fzpf66jx4anz8w
236450
236439
2026-09-01T07:01:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236450
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>पुन्हा चालना मिळाली. 'स्फूर्तिनिनाद' (१९५०) आणि 'स्फूर्तिविलास (१९५४) हे आणखी दोन काव्यसंग्रह याच काळात प्रसिद्ध झाले. त्यांच्या एका नाट्यविषयक व्याख्यानाने प्रा. श्री. के क्षीरसागरांसारखा, रसिक समीक्षक, एवढा प्रभावित झाला की काव्यविहारीनी आपली नाट्यविषयक मौलिक माहिती रसिकांपर्यंत पोचवावी म्हणून गद्यलेखनाचा आग्रह त्यानी काव्यविहारींकडे धरला. त्यातूनच "नाट्यसुगंध' (१९६०) व ‘नाटककार देवल-व्यक्ति आणि वाङमय' (१९६३) अशी त्यांची दोन पुस्तके सिद्ध झाली. श्री.के.क्षींच्याच आग्रहावरून त्यानी 'माझे वाङ्मयीन जीवन' हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले.

{{gap}}काव्यविहारीना आपले आत्मचरित्र काव्यात गुंफायची फार अिच्छा होती. ६ सप्टेंबर १९६१ ते २७ सप्टेंबर १९६१, या २१ दिवसात "जीवनदर्शन-आत्मचरित्रपर खंडकाव्य,” दररोज सलग चार तास 'सविकल्प समाधी'त बैठक ठोकून, मोठ्या तन्मयतेने त्यानी लिहून पूर्ण केले. अर्थात् त्यामध्ये १९६१-६२ पर्यंतचाच काळ आला आहे. या खंडकाव्याची चरणसंख्या ४६१८ आहे. दुर्दैवाने हे खंडकाव्य अद्यापपावेतो अप्रकाशित राहिले आहे. प्रसिद्ध झाले असते, तर पद्यात्मक आत्मचरित्र म्हणून, मराठी साहित्यात गौरवाचे स्थान त्याला निश्चित प्राप्त झाले असते. कारण मराठीत गद्य आत्मचरित्रांचे अदंड पीक आलेले असले, तरी पद्यात्मक आत्मचरित्र, हा अत्यंत दुर्लभ प्रकार आहे. हे आत्मचरित्र एका अर्थी अपुरे असले, तरी बऱ्याच अर्थी पूर्ण झालेले आहे. याचे कारण असे की काव्यशास्त्रविनोदात रममाण होऊन सुखाने वानप्रस्थाश्रमाची वाटचाल करत असेपर्यंतचा सगळा भाग या चरित्रात आला आहे. पुढे एका सायकलची धडक बसून त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसला. त्यातच त्याना अर्धांगाचा झटका आला. नंतर त्यांची प्रकृती थोडी सुधारली पण लेखन मात्र बरंचसं थंडावलं. १९७१-७२ मध्ये घरीच कॉटवरून पडून त्यांच्या मांडीचे हाड मोडले आणि ते पूर्णपणाने आंथरुणाला खिळले. अखेर २२ जानेवारी १९७५ रोजी ते शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन झाले! शेवटच्या विकलांग अवस्थेतसुध्दा त्यांनी मनाची शांति व चेहेऱ्यावरची प्रसन्नता आश्चर्यकारकपणे जपली होती.

{{gap}}असं म्हणण्याचं कारण अितकचं की तसे ते मनमोकळ्या स्वभावाचे व मित्रांच्या मोठ्या कळपात वावरणारे नव्हते. न्यायखात्याच्या नोकरीमुळे असेल कदाचित्, पण तर्ककर्कश आणि कतर्व्यकठोर होते. त्यांची कवयित्री कन्या, सौ. विमल काळे यानी एके ठिकाणी म्हटलय "तसे आप्पा (काव्यविहारी) थोडे रागीट, एककल्ली, स्पष्टवक्ते आणि तऱ्हेवाईक म्हणून प्रसिध्द होते.......त्याना बुधगावात एकही जिव्हाळ्याचा मित्र नव्हता......त्यांची कामातली शिस्त, वेळेच्या बाबतीतला काटेकोरपणा आणि निःस्पृहता यामुळे राजेसाहेबांसकट, सर्वजण त्याना वचकून असत." हे मुद्दाम<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................... ११५</noinclude>
qbh0bjmedtaf8gkkeux8w2wbibz38fb
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४०
104
77666
236451
202633
2026-09-01T07:17:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236451
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अुद्धृत करण्याचे कारण अितकेच की त्यांचे वरील दोष समजले जाणारे स्वभावविशेष, वास्तवात सद्गुणच मानावे लागतील. न्यायखात्यात निःस्पृहपणे वागायचे तर समाजात फार सवंगपणे वागून चालत नाही. आज गरजेपेक्षा अधिक सैलपणाने वागणारे आणि समाजात स्वतःला 'सवंग' करुन घेणारे अुच्चपदस्थ अधिकारी बघितले आणि त्यामुळे भ्रष्ट होत असलेले समाजजीवन बघितले, तर काव्यविहारींसारख्यांचा मोठेपणा स्पष्ट होईल.

{{gap}}प्रा. श्री. के. क्षीं नी तर काव्यविहारींच्या वाङमयीन आत्मचरित्रात्मक पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना, मार्मिकपणे म्हटलय की "त्यांच्या व्यक्तिमत्वात रोमँटिक कवी आणि संस्थानी मामलेदार यांचे विचित्र मिश्रण आहे. टेबलावरील फायली झपाझप अरकून टाकणे, हा ज्यांचा दैनंदिन कार्यक्रम, अशा 'हपीसरांसारखी' त्यांच्या मनाची अंशतः घडण आहे तर अंशतः रविकिरण मंडळाच्या पूर्वीच्या रसिक, आदरशील, आशावादी आणि प्रगतिशील कवीसारखी आहे.' त्यांचे जामात, प्रिं. क. श्री. काळे यानी काव्यविहारीविषयक अनेक प्रकाशित लेखांचे, निवडक प्रातिनिधिक कवितांचे साक्षेपी संपादन करुन, एक अुत्तम संग्रह तयार केला आहे. पुस्तकरूपाने जरी ते प्रसिद्ध केले नसले तरी त्या संग्रहाच्या प्रती त्यानी पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र साहित्यपरिषद्, सांगली नगरवाचनालय, अशा महत्वाच्या संस्थांकडे दिल्या आहेत. काव्यविहारींच्याविषयी लेखन करु अिच्छिणाऱ्या अभ्यासकांना हे काम उपयुक्त ठरेल.

{{gap}}सांगलीतील साहित्यप्रेमी रसिक काव्यविहारींचे अत्यंत सहृदयतेने स्मरण ठेवतील यात शंका नाही.

{{center|●●●}}
{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर............................११६</noinclude>
djp6xkkqs3nwjm0oc5l91v3gclgq06u
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४१
104
77667
236452
202636
2026-09-01T07:39:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236452
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>
{{center|
{{xx-larger|'''बुद्धिबळपटू भालचंद्र म्हैसकर'''}}}}
{{rule}}{{rule|height=4px}}{{rule}}
{{gap}}सांगली नगरीला क्रिकेट, बॅडमिंटन अशा खेळांची खास परंपरा नव्हती. मात्र विजय हजारे आणि नंदू नाटेकर या सांगलीच्या सुपुत्रानी, वैयक्तिक कौशल्याच्या जोरावर, मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये यश मिळवलं. पण बुद्धिबळाच्या बाबतीत मात्र तसं म्हणता येत नाही. या खेळाची सांगलीत किमान दोनशे वर्षांची परंपरा आहे. अेकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, सांगलीत मोरभटजी मेहेंदळे, विनायकराव खाडिलकर, बाबा बोडस, गोपाळराव मुजुमदार (म्हणजे सुप्रसिद्ध कवि साधुदास) नारायणराव जोशी, अण्णा गद्रे या मंडळीनी बुद्धिबळाची परंपरा निर्माण केली. आपल्या खेळातील कौशल्याने सांगलीचे नाव सर्वतोमुखी केले. हीच परंपरा नंतरच्या पिढीतील शंकरराव म्हैसकर, बाळशास्त्री फाटक, अप्पासाहेब (पु.ल.) खाडिलकर, नारायणराव खाडिलकर तम्माणाचार्य पडसलगीकर (नूतन बुद्धिबळ मंडळ,सांगली या संस्थेचे अध्यक्ष, भाऊसाहेब पडलगीकर यांचे वडील) आदी सांगलीकरानी अधिकच गौरवशाली बनवली. याच पिढीमधील एका सांगलीकराने, सांगलीचं नाव बुद्धिबळाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्या सांगलीकराचं नाव भालचंद्रपंत म्हैसकर.

{{gap}}म्हैसकरांचा जन्म १९०८ सालचा. बुद्धिबळाचं तसं त्याना बाळकडूच मिळालेलं होतं. त्यांचे वडील परशरामपंत, सावत्र बंधू शंकरराव म्हैसकर हे नामांकित बुद्धिबळपटू होते. चुलते खेळत असत. अितकेच काय पण त्यांचे आजोबा रंगात आले की गोल लाकडी ढोकळ्यांची तांबडी-पिवळी बुद्धिबळे घेऊन खेळत बसत! याहून गमतीची गोष्ट म्हणजे खुद्द म्हैसकरांच्या लग्नात त्यांच्या वडिलाना बुद्धीबळात गुंग झालेले असताना, आग्रहाने बोलावून आणायला लागलं! म्हैसकरांची आई लहानपणीच गेलेली असल्याने लग्नाच्या वेळी देवक चुलत्याना बसवायचे होते. त्यामुळे वडील खेळायला मोकळे होते!. अितक बुद्धिबळाचं बाळकडू!

{{gap}}म्हैसकरांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरात झाले. शालेय आणि महाविद्यालयीन<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर..................११७</noinclude>
2a6alvmuafmjhvif5724d9wjbfbysnr
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४२
104
77668
236453
202637
2026-09-01T07:47:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236453
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>शिक्षण सांगली-कोल्हापूर येथे झाले. १९२९ मध्ये विलिंग्डन कॉलेजातून ते बी. ए. झाले. वडील मराठी सनद असलेले संस्थानी मुलुखातील वकील होते. मुलाने नुसतेच एच.पी. (हायकोर्ट प्लीडर) होऊन वकिली करण्यापेक्षा एल. एल. बी. करुन मोठा वकील बनावे असे वडिलाना वाटे. म्हणून म्हैसकरानी पुण्यात राहून एल. एल. बी. केलं. त्या काळातील बी. ए. एल. एल. बी म्हणजे म्हैसकराना वकिलीत मोठीच करीअर करता आली असती. तसे त्यानी पोटापाण्यासाठी सांगली संस्थानात आणि बुधगाव संस्थानात अनेक अुद्योग केले. काही दिवस वकिली, काही दिवस मुन्सफगिरी, काही दिवस चक्क एका कारखान्यात मॅनेजरगिरी केली पण काही कारणाने असेल, त्या अुद्योगांमध्ये ते रमले नाहीत. शेवटी रमले ते शिक्षकपेशात! याचं मुख्य पटणारं अघड कारण असं असावं की या पेशामध्ये त्याना आपल्या आवडत्या खेळासाठी, म्हणजेच बुद्धिबळासाठी अधिक वेळ आपसूक मिळत होता. बुद्धिबळाचं त्याना अतोनात वेड होतं. जातिवंत क्रिकेटर, फलंदाजी करताना काय किंवा क्षेत्ररक्षण करताना काय, चेंडूवरची आपली 'नजर' कधीच काढत नाही. तसंच म्हैसकरांच होतं. बाप-लेक दोघंहि बुद्धिबळात वेडी झालेली माणसं. सकाळीच अठून बुद्धिबळाचा पट मांडून बसत. पक्षकार येऊन आज आपली कोर्टात तारीख आहे, अशी तारस्वरात बोंब ठोकेपर्यंत त्याना पत्ताच नसे! मग कसली वकिली? 'खंडाळी' सारख्या आडगावच्या खेड्यात नोकरीला असताना सुद्धा, बरोबर कोणी खेळायला मिळायला नाही तर म्हैसकर जुनी इंग्रजी वर्तमानपत्रे काढून बसत. नामवंत खेळाडूंचे डाव आणि त्यानी केलेल्या खेळातील सुरेख चाली (Moves) त्यामध्ये दिलेल्या असत. म्हैसकर त्याचा अभ्यास करत बसत. किंवा 'लास्कर'चे 'चेस स्ट्रॅटेजी बाय एडवर्ड लास्कर' हे पुस्तक काढून त्यात डोके खुपसून बसत! पुढे एकदा मोठ्या बुद्धिबळ स्पर्धा म्हैसकरानी जिंकल्या तेव्हा त्यांचा सत्कार झाला. सांगलीचे नामवंत लेखक 'साधुदास' अर्फ गोपाळराव मुजुमदार, वर अुल्लेखलेल्या 'लास्कर' ला गमतीने 'रास्कल' म्हणत असत. वरील सत्कारप्रसंगी म्हैसकर साधुदासाना गंमतीने म्हणाले. "तुमच्या 'रास्कलनेच' मला यश मिळवून दिले. "

{{gap}}म्हैसकरांचा बुद्धिबळाचा खेळ आपले वडील, सावत्र बंधू, परिचित मंडळी, शेजारी-पाजारी यांजबरोबर नेहेमीच चालत असे. सांगलीतील जुन्या पिढीतील प्रख्यात धन्वंतरी आणि सांगली जिमखान्याचे सर्वेसर्वा डॉ. व्ही. एन. देसाई (बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आजोबा) यानी १९२३ ते १९२६ च्या दरम्यान सांगलीत 'सदर्न मराठा कंट्री चेस टूर्नामेंटस्' भरविल्या, तेव्हा म्हैसकरानी या स्पर्धेत भाग घेऊन ज्युनिअर खेळांडूमध्ये चांगले नाव कमावले होते.{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................... ११८</noinclude>
9pjl8zcjix880ajg2icjctxxb4pf3ic
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४३
104
77669
236454
202639
2026-09-01T07:50:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236454
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{gap}}पण मातब्बर- सीनिअर खेळाडुंमध्ये खेळण्याचा योग मात्र अचानक आला.

{{gap}}१९२९ च्या मे महिन्यात सांगलीच्या देवल क्लबने बुद्धिबळ सामने आयोजित केले होते. अर्थातच सीनिअर खेळांडूसाठी. त्यात तरुण म्हैसकरांना अचानक प्रवेश मिळाला. स्पर्धेसाठी बाबा बोडस, पुण्याचे प्रो. अलूरकर, साधुदास असे सीनिअर खेळाडू होते. एकूण ११ खेळाडू झाले. फेरी पूर्ण होण्यासाठी आणखी एकाची आवश्यकता होती. म्हैसकरांचे वडील खेळणार होतेच. त्याना आपल्या मुलाचा खेळ माहीत होता. त्यानी आयोजकाना आग्रह करुन तरुण म्हैसकराना स्पर्धेत प्रवेश मिळवून दिला.

{{gap}}या सुवर्णसंधीचा म्हैसकराना भविष्यकाळात फारच अुपयोग झाला.

{{gap}}त्यांची पहिलीच फेरी साधुदासांबरोबर झाली. तरुण म्हैसकर जिद्दीने खेळत होते. सामना बरोबरीत सुटणार असा चुरशीत चालला असतानाच, म्हैसकरानी एक चूक केली. नेहेमीच्या त्याच त्याच पारंपारिक खेळ्या करण्याऐवजी, एकदम जिंकायच्या दृष्टीने त्यांनी चाली रचल्या. त्या त्यांच्याच अंगाशी आल्या आणि घोड्यांच्या अखेरीत ते हरले. पण साधुदासांना तरुण म्हैसकरांच्या खेळाचा दर्जा आणि आवाका कळून चुकला. ते अितरांना म्हणाले “विंचवाचं पिल्लू आहे. सांभाळा रे." मग बाबा बोडस म्हणाले, "अजून अनुभवशास्त्र माहीत नाही. "

{{gap}}त्या स्पर्धेतील दुसरे, तिसरे राउंडस बाळशास्त्री फाटक आणि के.आर.हौसिंग यांच्याबरोबर होते. ते म्हैसकरानी जिंकले. पुढचा राअुंड चक्क खुद्द त्यांच्या वडिलांबरोबर झाला. त्यात म्हैसकर हरले. पाचवा राउंड नामांकित खेळाडू प्रो. अलुरकर यांच्या बरोबर झाला. मोठा चुरशीचा खेळ झाला. म्हैसकरानी कमाल केली. प्रो. अलूरकरांवर मात करुन जाणकार मंडळींमध्ये खळबळ अडवून दिली. त्याचे वर्णन खुद्द म्हैसकरानी स्वतःच्या आत्मचरित्रात केले आहे. ते असे.

{{gap}}"माझा पाचवा राअुंड प्रो. अलुरकर याजबरोबर झाला. मी कॅसल केले नाही. ॲटॅक लावला. पण एक चूक राहिली आणि लहान मोठे गेले. पुन्हा मी एक घोडे प्याद्याखाली टाकले व अुजव्या कडेच्या पट्टीत वजीर हत्ती जुळवून त्यांच्या (अलूरकरांच्या) राजाला हैराण करुन सबंध हत्ती परत मिळवला. लोक कौतुकाने बघत होते. भाल्या म्हैसकरने प्याद्याखाली घोडे कसे टाकले आहे, ते पहायला म्हणून बाबा बोडसानी, जुने पट्टीचे खेळाडू अण्णा गद्रे याना शेजारच्या खोलीतून बोलावून आणले. डावात वजिरा वजिरी होऊन हत्ती, पाच पाच प्यादी अशी अखेरी अरली. माझा राजा पुढारलेला मुक्त प्यादे घेऊन सरु लागला व माझ्या हत्तीने<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर................................११९</noinclude>
0xm52xuoyv11p88on11rx2jmdcuy4c3
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४४
104
77670
236455
202642
2026-09-01T07:52:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236455
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>पिछाडीस जाऊन त्यांचे प्यादे मुक्त होऊ दिले नाही व प्रोफेसराना (अलूरकराना) माझ्या प्याद्यास हत्ती द्यावा लागला व मी डाव जिंकला. प्रोफेसरानी रिझाईन केल्याबरोबर मी अुठलो आणि वडिलांच्या अंगावर अक्षरशः अडी मारुन त्यांच्या गळ्याला मिठी मारली. सावत्र बंधू शंकरदादा सर्व पहायला होतेच. बाबानी 'फार नाचू नको. शांत रहा” असे सांगितले...माझ्या खेळाने बुद्धिबळक्षेत्रात एकच धमाल अुडाली. दुसरे दिवशी साधुदासानी रस्त्यात चुन्याने लिहवून घेतले, "गज गोष्पदी बुडाला."

{{gap}}या स्पर्धेत म्हैसकराना बक्षिस मिळाले नाही. पण त्यांच्या खेळाचा दर्जा वाढला. दबदबा वाढला, मुख्य म्हणजे त्या दिवसापासून त्याना सीनिअर खेळाडूंमध्ये प्रवेश मिळाला. कोणत्याहि स्पर्धेतील त्यांचा प्रवेश सुकर झाला.

{{gap}}त्यापेक्षाहि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याना स्वतःची 'ओळख' मिळाली!

{{gap}}त्यानंतर जमेल त्या स्पर्धांतून भाग घेण्याचा त्यानी सपाटा लावला. सांगलीचे 'साधुदास' काही काळ तत्कालीन सांगली संस्थानच्या सरकारी छापखान्याचे मुख्य होते. त्या अधिकारात ते ब्रिटीश चेस मॅगेझिन्स मागवत. त्यामध्ये नामांकित खेळाडूंचे गाजलेले डाव दिले जात. म्हैसकर त्या डावांचा अभ्यास करत, त्याचे चिंतन करत. काही डाव वहीमध्ये अतरुन घेत. कारण एक तर अशी पुस्तके, मॅगेझिन्स दुर्मिळ असत आणि दुसरे म्हणजे विकत घेण्याची ऐपत नसे. मात्र म्हैसकराना सांगलीत निष्णात खेळाडूंचे डाव नेहेमी पहावयास मिळत. लोकमान्य बुक डेपोचे दीक्षित किंवा विष्णुपंत राजवाडे यांच्या चिंतामणी प्रेसमध्ये, सीनिअर खेळाडूंच्या बैठका होत. त्यांच्या खेळांचा अभ्यास करता येई.

{{gap}}सांगलीत २४ डिसेंबर १९३३ ते २ जानेवारी १९३४ च्या दरम्यान विष्णुपंत राजवाडे यानी बुद्धिबळ स्पर्धा भरविल्या. म्हैसकराना अर्थात् आमंत्रण होतेच. पण त्याना ११ पैकी फक्त अडीच गुण मिळाले. फक्त विनायकराव खाडिलकर यांच्यासारख्या प्रथितयश खेळाडूवर 'डबल रुक एंडिंग' ने डाव करता आला एवढीच कमाई !

{{gap}}१९४१ मध्ये म्हैसकराना पुण्याला "कॅप्टन रानडे चेस टूर्नामेंट्स” जाहीर झाल्या होत्या, त्यात भाग घ्यायची संधी मिळाली. या संधीचे मात्र म्हैसकरानी सोने केले. आपला आजवरचा अभ्यास त्यानी पणाला लावला. कर्जत, मुंबई, पुणे, सांगली अशा ठिकाणांहून आलेल्या मोठमोठ्या खेळाडूंचा पराभव करत स्पर्धेत त्यानी दुसरा क्रमांक पटकावला. रु. १२५/- चे त्याकाळचे घसघशीत बक्षिस मिळवले. खरं तर पहिल्या नंबरचाच मान मिळायचा. पण 'साधुदास' अुर्फ गोपाळराव मुजुमदारांवर,<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर........................१२०</noinclude>
p9tuy8ly8n6ur5a4xlmzleaxhoxz87v
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४५
104
77671
236456
202644
2026-09-01T07:55:00Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236456
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आयत्या वेळी त्यांच्या गुरुची (म्हणजे हणमंतराव कोटणीस) कृपा झाली म्हणून ते जिंकले. अर्थात् अशी त्या साधुदासांची श्रद्धा होती. स्पर्धा संपल्यावर तेच म्हैसकराना म्हणाले, दोघांच्या सामन्यात एक वेळ अशी आली होती की गोपाळराव (साधुदास) संभ्रमित अवस्थेत होते. त्या 'नेमक्या' क्षणी तात्यांनी (कोटणीसानी) कानात सांगितले, "गोपाळ, मात होत आहे. नीट पहा." आणि मी सावध झालो.

{{gap}}हा अर्थातच श्रद्धेचा भाग होता. गंमत म्हणजे पुढे काही वर्षानंतर म्हैसकरानी याच कोटणीसमहाराजांच्या चिरंजिवांकडून म्हणजे रघुनाथराव तथा बाबुराव कोटणीस याजकडून अनुग्रह घेतला!

{{gap}}यानंतर म्हैसकरानी प्रांत पातळीवरील बुद्धिबळस्पर्धेत खेळायला सुरुवात केली. १९४८ मध्ये चेस क्लब ऑफ इंडिया यानी मुंबईत भरवलेल्या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवून चांदीची फिरती ढाल मिळवली. या स्पर्धेत आर. बी. सप्रे, वाड, रत्नाकर, डॉ. कुन्हा, बिलीमोरिआ अशा राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंबरोबर आपला खेळ अजमावण्याची त्याना संधी मिळाली. चांगला अनुभव मिळाला. तत्कालीन मुंबई स्टेटचे गव्हर्नर राजा महाराजसिंग यांच्या हस्ते बक्षिससमारंभ झाला. म्हैसकरानी इंग्रजीत भाषण केले. मुंबईत खेळण्याची मजा काही औरच असते. लगोलगच म्हणजे १९५० मध्ये मुंबईच्या चेतना रेस्टॉरंटमध्ये झालेल्या मॅचेसमध्ये त्याना खेळायला मिळाले. या मॅचेसना मुंबईच्या वृत्तपत्रांतून, विशेषतः इंग्रजी वृत्तपत्रांतून कशी प्रसिद्धी असते त्याची पण चव त्याना चाखायला मिळाली. एम्. के. गवांडे या खेळाडूसमोर खेळताना म्हैसकराना हार खावी लागली. अनेक सामने जिंकणाऱ्या म्हैसकरांच्या या पराभवाचे इंग्रजी वृत्तपत्राचे हेडिंग होते "गवांडे- म्हैसकर्स वाटर्लू"

{{gap}}स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५५ साली आंध्र-प्रदेशातील एलूरु येथे पहिली ऑल इंडिया चेस टूनामेंट झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातर्फे खेळण्यासाठी आणखी अितर दोघांबरोबर म्हैसकरांची निवड झाली होती. राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा त्यांचा हा पहिलाच अनुभव. मुंबईचे सप्रे, कानपूरचे रामदास गुप्ता, केरळचे सी. एल. सुब्रम्हण्यम्, ओरिसाचे प्रा.राजगुरु, मद्रासचे एस. के. नरसिंहम् अशा खेळाडूंबरोबर गाठ होती. या स्पर्धेत म्हैसकर तिसरे आले खरे, पण स्वतःवरच थोडे नाराज झाले. राष्ट्रीय स्तरावर खेळताना आपल्या मर्यादांची त्याना जाणीव झाली. अनेक डाव हकनाक हातातून निसटले याचे त्याना दुःख झाले. त्याना स्वतःला ओपनिंगची थोडी भीती वाटे. मात्र मिडलगेम त्याना चांगला अवगत होता. शक्यतो एंडगेमपर्यंत डाव जाऊ द्यायचाच नाही. मध्येच जिंकायच्या प्रयत्नात सतत रहायचे. डाव हातातून जातोय अशी स्थिती<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................१२१</noinclude>
3rktfxuds2jydxukl73cqn5ns3opqhq
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४६
104
77672
236457
202693
2026-09-01T07:57:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236457
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>आली की साधुदासानी सांगितल्याप्रमाणे, अुगाच चुकीच्या खेळ्या खेळत रहायचे. या भ्रामक खेळ्यांमुळे खरोखरच प्रतिपक्ष कधी कधी बुचकळ्यात पडे आणि डाव बरोबरीत सुटे. पण पहिल्या राष्ट्रीय स्पर्धांतून खेळताना म्हैसकराना आपल्या नेहमीच्या खेळांमधील अुणिवांची प्रकर्षाने जाणीव झाली हा या राष्ट्रीय स्पर्धांचा मोठाच फायदा झाला. म्हैसकरानी पुस्तके काढून चिंतन केले.

{{gap}}या चिंतनाची आवश्यकता होतीच होती.

{{gap}}कारण म्हैसकरांच्या हातावर रेषा अमटत होती ती परदेशगमनाची. १९५६ च्या ऑगस्टमध्ये रशियात चेस ऑलिंपिक भरायचं होतं. मग त्यासाठी भारतातर्फे खेळणाऱ्या खेळाडूंची निवड कशी करायची, यासाठी डॉ. जोसेफ स्टाईन या नामवंत बुद्धिबळपटूने अहमदाबाद येथे 'इन्व्हिटेशन टूर्नामेंटस्' भरविल्या. या स्पर्धेत जे स्पर्धक पहिल्या चार क्रमांकात येतील त्याना मॉस्को ऑलिंपिकला पाठवण्याचे ऑल इंडिया चेस फेडरेशनने मान्य केले होते. म्हणजे एका अर्थी अहमदाबाद येथे होणाऱ्या मॅचेस या 'सिलेक्शन' मॅचेसच होत्या. रामदास गुप्ता, अलूरकर, सप्रे, वैंकय्या, जी. एस. दीक्षित असे अनेक चॅपिअन्स अहमदाबादेस जमले होते. म्हैसकरानी पहिल्याच सामन्यात आंध्र प्रदेशच्या दीक्षितवर तुफानी हल्ला चढविला आणि एलुरुला त्याच्याकडून झालेल्या पराभवाचे भुट्टे काढले. नंतर चुरशीचा राउंड अलुरकर यांजबरोबर झाला. तो त्यानी टॉप क्वीन एंडिंग खेळून जिंकला. केरळच्या राजारामकडून त्याना हार पत्करावी लागली तरी एकूण स्पर्धेत म्हैसकराना चौथा क्रमांक मिळाला.

{{gap}}म्हणजे रशिया ऑलिंपिक निश्चित झालं !

{{gap}}भारताची टीम म्हणून दर्भवैकय्या, आर. बी. सप्रे, रामदास गुप्ता आणि म्हैसकर अशी चारजणांची टीम अहमदाबादच्या सिलेक्शनप्रमाणे जायची होती. रशियन हद्दीत पोचल्यापासूनचा या भारतीय टीमचा सर्व खर्च रशियन सरकार करणार होते. तिथंपर्यंत जाण्यायेण्याचा खर्च मात्र प्रत्येक खेळाडूला स्वतःच्या पैशातूनच करावा लागणार होता.

{{gap}}म्हैसकराना हे समजल्यावर थोडा धक्काच बसला. बुद्धिबळाचं ठीक आहे पण 'अर्थबळाचं' काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर अभा ठाकला!

{{gap}}सांगलीचे 'गुणी जनांचे आधारु' श्रीमंत चिंतामणराव अप्पासाहेब आणि अन्य सांगलीकरांनी मदतीचा हात पुढे केला. म्हैसकरांचे वर्गमित्र सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ श्री. जे. पी. नाईक आणि चित्रा नाईक यानी परदेशात वागावं कसं, अिथंपासून सर्व<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर....................................१२२</noinclude>
oj4ph33x42sp9grzscl7e4ywqdr57me
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४७
104
77673
236458
202695
2026-09-01T07:59:21Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236458
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>गोष्टीचे मार्गदर्शन केले. सिटी हायस्कूलमधील त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यानी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी साह्य केले. सिटी हायस्कूलच्या राजवाडा शाखेमध्ये, म्हैसकराना, श्री. के.जी. दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली रशियाला जाण्यासाठी थाटामाटात निरोप देण्यात आला. त्यांचा सत्कार करण्यात आला.

{{gap}}आज परदेशगमनाचं कौतुक राहिलं नाही पण ४५-५० वर्षापूर्वी त्याची अपूर्वाई होती!

{{gap}}काबूल- ताश्कंदमागे सप्रे, म्हैसकर वगैरेंची बुद्धिबळ टीम ३१ ऑगस्ट १९५६ रोजी मॉस्कोला पोचली. १ सप्टेंबरपासून सामने सुरु झाले. यजमान रशियासह एकूण ३४ राष्ट्र ऑलिंपिकसाठी मॉस्कोत जमली होती. जगातील नामवंत खेळाडू आले होते.

{{gap}}पण दुर्दैवाने भारतीय टीमचा पूर्ण फज्जा अुडाला.

{{gap}}सांघिक खेळाच्या तंत्रात आणि आंतरराष्ट्रीय खेळातील स्पर्धांच्या अनुभवात भारतीय खेळाडू फारच कमी पडले. भारतीय खेळात नियोजन नव्हते. खेळ आणि खेळाडू यात अत्यावश्यक असा संवाद नव्हता. परिणामी पराभव अपरिहार्य होता.

{{gap}}तरीपण वैयक्तिकपणे खुद्द म्हैसकरांचे चिली, आयर्लंड आणि फिनलंडच्या खेळाडूंबरोबरचे डाव चांगले झाले. फिनलंडविरुद्ध जिंकलेला त्यांचा डाव '१२ वी चेस ऑलिंपियाड' या पुस्तकात छापून आला. म्हैसकरांच्या मते जिंकण्याची तीव्र अिच्छा भारतीय खेळाडूंमध्ये नव्हती. पराभूत मनोवृत्तीने त्यांचा खेळ झाला. आंतरराष्ट्रीय वातावरणाचा मानसिक दबाव होता. हा दबाव अितका होता की म्हैसकरांची रशियामधली पहिलीच लढत आईसलंडच्या 'मोलर' नावाच्या खेळाडूबरोबर झाली. नाव समजले तेव्हाच म्हैसकर मनोमन खचले. त्याना वाटले की बुद्धिबळात 'मोलर ॲटॅक' म्हणून हल्ला करण्याची पद्धती आहे, त्या मोलरचाच कुणी वंशज त्यांचा प्रतिस्पर्धी आहे. एवढा मानसिक दबाव!

{{gap}}यानंतरही म्हैसकर भारतातील मॅचेसमध्ये खेळत राहिले. दिल्ली, हैद्राबाद, मुंबई, मद्रास येथील ऑल इंडिया चेस टूर्नामेंटस्, त्याचप्रमाणे इतर कमी अधिक महत्वाच्या स्पर्धांमधून ते खेळले. पुण्याची रानडे चेस टूर्नामेंट जी फक्त हिंदूंकरिताच होती, ती पुढे सर्वांसाठी खुली झाली, तेव्हा म्हैसकर त्यात पहिले आले.

{{gap}}खुद्द म्हैसकरानीच लिहून ठेवलंय की हा विजय हा तसा स्पर्धांमधील असा शेवटचाच. त्यानंतर त्यांच्या खेळास अुतरती कळा लागली. "नवीन कल्पना, पुस्तकी<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर...................................१२३</noinclude>
js5l9bodiwpve6qhgzpgkh7p4ipinp9
पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१४८
104
77675
236459
202696
2026-09-01T08:13:03Z
कल्पनाशक्ती
3813
/* प्रमाणित */
236459
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>अभ्यास, तरुण रक्त यानी मला पाठीमागे ढकलण्यास सुरुवात केली.” त्यानंतर मोठ्या स्पर्धांमधील म्हैसकरांचा सहभाग अर्थातच कमी झाला. होतकरू खेळाडूंना मार्गदर्शन करण्यात त्यानी अुर्वरित आयुष्य घालवले. अलीकडेच त्यांचे निधन झाले.

{{gap}}आजच्या घडीला सांगलीचं नाव बुद्धिबळ क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रतिष्ठित आहे ते भाऊसाहेब पडसलगीकर आणि त्यांचे सहकारी यांच्या अथक प्रयत्नांमुळे. म्हैसकरानी बुद्धिबळासाठी अशा तऱ्हेचे भरीव काम मात्र केले नाही. यात त्यांच्या काही अंगभूत स्वभावदोषाचा भाग होता.

{{gap}}तरीपण या सांगलीकराने आपल्या गावाचं नाव बुद्धिबळाच्या क्षेत्रात थोडेसे परदेशात आणि बरेचसे अखिल भारतात दुमदुमत ठेवलं यात शंकाच नाही.

{{center|●●●}}
{{nop}}<noinclude>{{rule}}
सांगली आणि सांगलीकर.....................................१२४</noinclude>
9dkzuzbegfktlo1dxn9ch2dgyehozz8
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९८
104
112002
236420
236392
2026-08-31T12:05:22Z
JayashreeVI
4058
236420
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८६)'''}}}}</noinclude>षयी आपलेपणा वाटण्यास सुरुवात होते. एक विशेष प्रकारची दृष्टि येते. ही विशेष प्रकारची दृष्टि, हा मनाचा कल, ही सर्वव्यापी विसंगतपणाची जाणीव, ही मनुष्यत्वाची ओळख, ह्मणजे विनोद. कोणी हलका ह्मणून त्याच्याकडे विनोदाचे लक्ष जातें, व कोणी मोठा ह्मणून त्याच्याकडे डोळेझांक होते, अशी वस्तुस्थिति नाहीं. उच्च, नीच व साधारण, अशा सर्व व्यक्तींशी त्याला कर्तव्य आहे. त्याला दृष्टिआड कांहीं नाहीं. तो सर्वसाक्षी व समदृष्टि आहे. ज्याला ज्याला ह्मणून सर्वगुणसंपन्नतेची आढ्यता असेल, त्यालात्याला स्खलनशील मनुष्यस्वभावाची प्रचीति आणून देणें, त्याचा गर्वपरिहार करणें हें विनोदाचे एक कार्य आहे. नव्या जुन्यांच्या विसंगतपणाचीं जीं वर उदाहरणे दिलीं आहेत, त्यांचा उद्देश, कमी अधीक मानानें अपूर्णत्वाचा वांटा प्रत्येकाला कसा मिळाला आहे तें लक्षांत यावे हा होय.
{{center|{{larger|'''एक आक्षेप.'''}}}}
{{gap}}कोणी असा आक्षेप आणतील कीं, उच्चनीच सर्व व्यक्तींनां एका पायरीवर बसविणें, दुसऱ्यांचे दोष शोधीत बसणें, हें क्षुद्रबुद्धीचें लक्षण आहे. दोषाकडे लक्ष न देता गुणाकडे लक्ष देणें यांत मनुष्यजातीचें हित आहे. खरे आहे. पण गुणाकडे लक्ष देणें, ह्मणजे दोषाचा अभाव मानणें असें होत नाहीं. सर्वांमध्ये मनुष्यत्व आहे, व मनुष्यत्व ह्मणजेच अपूर्णत्व आहे, असें मानिल्यानें उच्चनीच अशा सर्वांना एका पायरीवर बसविल्याचा आरोप लागू पडत नाहीं. शिवाय, विनोद ह्मणजे दोषाचा शोध, ही कल्पनाच मुळी चुकीची आहे. जितकीं माणसें तितकीं मतें असें समाजांत होत असल्यामुळे, कोणती ग्राह्य व कोणती त्याज्य, व ती कशामुळे, याचा निर्णय होणें अवश्य असतें. पुष्कळ मतें अशीं असतात कीं, त्यांनी त्याज्य व ग्राह्य, हे भेद लावणेंच शक्य नसतें. मताप्रमाणेंच चालीरीतींची गोष्ट असते. उदाहरणार्थ, डाव्या किंवा उजव्या हातानें पाणी पिणे यांत अमुक ग्राह्य, व अमुक त्याज्य, असा भेद करणें शक्य नाहीं. कोणत्या तरी कारणानें एक हात जायां झाला, किंवा कायमचा निरुपयोगी झाला, तर उरलेल्या हाताचा उपयोग करणें प्रत्येकाला भाग आहे. तसेंच रस्त्यांतून जातांना डाव्या बाजूनें चांगलें कीं उजव्या, हें ठरविणें अशक्य आहे .इंग्लंडमध्ये डाव्या बाजूने जातात तर फ्रान्समध्ये उजव्या बाजूने जातात. इंग्लंडमध्यें खास आमंत्रण असल्या-<noinclude></noinclude>
bp7ucrgntry1l4q4bo8cz010nlo80ha
236421
236420
2026-08-31T12:05:46Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
236421
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८६)'''}}}}</noinclude>षयी आपलेपणा वाटण्यास सुरुवात होते. एक विशेष प्रकारची दृष्टि येते. ही विशेष प्रकारची दृष्टि, हा मनाचा कल, ही सर्वव्यापी विसंगतपणाची जाणीव, ही मनुष्यत्वाची ओळख, ह्मणजे विनोद. कोणी हलका ह्मणून त्याच्याकडे विनोदाचे लक्ष जातें, व कोणी मोठा ह्मणून त्याच्याकडे डोळेझांक होते, अशी वस्तुस्थिति नाहीं. उच्च, नीच व साधारण, अशा सर्व व्यक्तींशी त्याला कर्तव्य आहे. त्याला दृष्टिआड कांहीं नाहीं. तो सर्वसाक्षी व समदृष्टि आहे. ज्याला ज्याला ह्मणून सर्वगुणसंपन्नतेची आढ्यता असेल, त्यालात्याला स्खलनशील मनुष्यस्वभावाची प्रचीति आणून देणें, त्याचा गर्वपरिहार करणें हें विनोदाचे एक कार्य आहे. नव्या जुन्यांच्या विसंगतपणाचीं जीं वर उदाहरणे दिलीं आहेत, त्यांचा उद्देश, कमी अधीक मानानें अपूर्णत्वाचा वांटा प्रत्येकाला कसा मिळाला आहे तें लक्षांत यावे हा होय.
{{center|{{larger|'''एक आक्षेप.'''}}}}
{{gap}}कोणी असा आक्षेप आणतील कीं, उच्चनीच सर्व व्यक्तींनां एका पायरीवर बसविणें, दुसऱ्यांचे दोष शोधीत बसणें, हें क्षुद्रबुद्धीचें लक्षण आहे. दोषाकडे लक्ष न देता गुणाकडे लक्ष देणें यांत मनुष्यजातीचें हित आहे. खरे आहे. पण गुणाकडे लक्ष देणें, ह्मणजे दोषाचा अभाव मानणें असें होत नाहीं. सर्वांमध्ये मनुष्यत्व आहे, व मनुष्यत्व ह्मणजेच अपूर्णत्व आहे, असें मानिल्यानें उच्चनीच अशा सर्वांना एका पायरीवर बसविल्याचा आरोप लागू पडत नाहीं. शिवाय, विनोद ह्मणजे दोषाचा शोध, ही कल्पनाच मुळी चुकीची आहे. जितकीं माणसें तितकीं मतें असें समाजांत होत असल्यामुळे, कोणती ग्राह्य व कोणती त्याज्य, व ती कशामुळे, याचा निर्णय होणें अवश्य असतें. पुष्कळ मतें अशीं असतात कीं, त्यांनी त्याज्य व ग्राह्य, हे भेद लावणेंच शक्य नसतें. मताप्रमाणेंच चालीरीतींची गोष्ट असते. उदाहरणार्थ, डाव्या किंवा उजव्या हातानें पाणी पिणे यांत अमुक ग्राह्य, व अमुक त्याज्य, असा भेद करणें शक्य नाहीं. कोणत्या तरी कारणानें एक हात जायां झाला, किंवा कायमचा निरुपयोगी झाला, तर उरलेल्या हाताचा उपयोग करणें प्रत्येकाला भाग आहे. तसेंच रस्त्यांतून जातांना डाव्या बाजूनें चांगलें कीं उजव्या, हें ठरविणें अशक्य आहे .इंग्लंडमध्ये डाव्या बाजूने जातात तर फ्रान्समध्ये उजव्या बाजूने जातात. इंग्लंडमध्यें खास आमंत्रण असल्या-<noinclude></noinclude>
lrpzo9t0mo9959xy0td1gwy3b7udwtl
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/९९
104
112003
236424
236393
2026-08-31T12:18:12Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
236424
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८७)'''}}}}</noinclude>शिवाय मुलांना पार्टीला नेत नाहींत, तर फ्रान्समध्यें आईबापांबरोबर मुलांनांहि आमंत्रण आहे असें समजतात. दक्षिणीलोकांत भोजनाला सोवळेंभांडेंच नेतात, तर गुजराथेंत काही लोकांत सोवळें पत्रावळ व द्रोण हीं घरून नेतात. शेंडी ठेवावी की नाही, मिशा ठेवाव्या कीं नाहीं, पोषाख कोणता करावा, असल्या प्रश्नंना ग्राह्म व त्याज्य हे भेद आगंतुक आहेत. मांसाहार ग्राह्य की त्याज्य, हा प्रश्नहि अशांपैकीच आहे. मांसाहार सर्वथैव त्याज्य ह्मणणारे लोक जीवावर बेतली असता ''''आत्मानं सततं रक्षेद्दारैरपि धनैरपि'''' या तत्वाचा अवलंब करून आपद्धर्म ऊर्फ सवडशास्त्र निर्माण करितात. शरीराची निगा व वाढ हा अन्न खाण्याचा उद्देश आहे हे लक्षांत ठेवलें ह्मणजे शरीराला हानिकारक तें त्याज्य, व गुणकारक तें ग्राह्य, असा सरळ निकाल लागतो. मांसाहार व शाकाहार यांनी पापपुण्याची कसोटी लावण्याची जरूरी रहात नाहीं. अशीं इतर अनेक उदाहरणे वाचकांनां सांपडतील कीं ज्यांनां त्याज्य ग्राह्य, हे भेद लावणें ह्मणजे काथ्याकूट करणे होय. ग्राह्य व त्याज्य हे भेद महत्वाच्या बाबीकरितांच आहेत. बालविवाह, स्त्रीपुरुषांचे संबंध, ज्ञातिभेद, मूर्तिपूजा, गुह्यवाद (Theosophy) निवृत्तिवाद, यांना हे भेद लावावयाचे असतात.
{{center|{{larger|'''खरें व खोटें यांची कसोटी.'''}}}}
{{gap}}सर्वच मतें, सर्वच चालीरीति, आळीपाळीनें ग्राह्य व त्याज्य आहेत, असें ह्मणणे ह्मणजे सत्य कांहींच नाहीं, सत्यासत्य हा भेदच भ्रामक आहे, असें ह्मणण्यासारखें आहे. कांहींच्या मते एक खरें, तर दुसऱ्याच्या मतें तेंच खोटें, असे जरी होत असले, तरी निवळ खरें व निवळ खोटें, असें जगांत कोणतेंच मत नाहीं, आणि अशी कोणतीहि चालरीत नाहीं, हें लक्ष्यांत ठेवणे अवश्य आहे. जगामध्यें विकास (development) आहे, व या विकासामध्यें अवशेषांचाहि (survivals) अंतर्भाव होतो. ह्मणून दरेक मतांत व चालीरीतींत अवशेषांची मिसळ आहे, खऱ्याखोट्यांचे मिश्रण आहे, हें लक्षांत न आल्यामुळे, मनुष्यप्राणी भांबावून जातो, आणि सत्यासत्य हा भेदच चुकीचा आहे, असें ह्मणण्यास तो तयार होतो. अवशेषांच्या मानाने विकासाचे प्रमाण, खो-<noinclude></noinclude>
801svtxjobv585k7uo7hc4vwwb0v2jf
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१००
104
112004
236428
236394
2026-08-31T12:29:31Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
236428
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८८)'''}}}}</noinclude>ट्याच्या मानानें खऱ्याचा अंश अतिशय असलेली मतें व चालीरीति ग्राह्य, व विकासाच्या मानानें अवशेषांचे प्रमाण, खऱ्याच्या मानानें खोट्याचा अंश अतिशय असलेलीं मतें व चालीरीति त्याज्य होतात. सृष्टीमध्ये विकास दिसतो, हे पुष्कळांनां कबूल असते; पण विकासाबरोबर अवशेष नष्ट होत नाहींत, इतकेंच नव्हे, तर विकासांत त्यांचा अंतर्भाव होतों, हें लवकर लक्षांत येत नाहीं. सत्याचीं रूपें जशीं अनंत, तशीं असत्याचीहि अनंत, हे तत्व पटत नाहीं, ह्मणून थोडासा सत्यांश असला की, तें सर्वथैव सत्य, व थोडासा असत्यांश असला कीं, तें सर्वथैव असत्य, अशी समजूत करून घेण्याची माणसाची प्रवृत्ति फार असते. पण कमीअधिक मानानें प्रत्येकाची सारखीच दशा होत असली, तरी मताभिमान हा राहतोच. नुसता मताभिमान राहू दिला, वाढू दिला, तर समाज सुरळीत न चालतां, तिरस्कार, असंतोष, मत्सर, व द्वेष ही त्यांत फैलावतील. मनुष्यांचे प्रयत्न देखील मंदावतील. पण खऱ्याखोट्याचा निर्णय होणे तर त्यांच्या प्रगतीला, योगक्षेमाला, अत्यावश्यक आहे. ह्मणून निर्भेळ सत्य, व निवळ असत्य, असें कांहींच नाहीं; सत्यासत्य यांचे एक ठराविक रूप नसून, तीं अगणित आहेत व तीं कमी अधिकमानानें मिसळलेली सर्वत्र आढळतात, अशी मनुष्यमात्राची खात्री पटविणें, हें विनोदाचें काम आहे. 'कमी अधिक मानानें' हे साधे दिसणारे शब्द कितीतरी महत्वाचे आहेत. यांचा विसर पडत असल्यामुळे संसारात कितीतरी भानगडी उत्पन्न झालेल्या आपल्याला दिसतात. सत्य व असत्य हीं दोन्हीं एकाच वेळीं ओळखण्याची शक्ति, ह्मणजेच सर्वबाजूंनी विचार करण्याची शक्ति होय. ही अंगांत आली, ह्मणजे खऱ्याचा अंश कमी असणारीं मतें पूर्णपणे खरीं मानणाराविषयीं तुच्छता न वाटतां सहानुभूति वाटू लागते. मतांविषयींचा तिरस्कार थोडादेखील कमी न होता भूल पडलेल्या माणसाविषयी आपलेपणाची जाणीव वाढते. 'Hate the system and not the products' अशी मनाची वृत्ति होऊं लागते. चूक, मिथ्याग्रह, यांनां कोणत्याना कोणत्या तरी बाबतींत दरेकजण बळी पडतो. चूक होणें हें मनुष्यत्त्वाचें, अपूर्णत्वाचे, विसंगतपणाचें लक्षण आहे, असें स्पष्ट भासूं लागतें. आतां प्रत्येकाला मनुष्यत्वाची ओळख पटविणे, ह्मणजे प्रत्येकाच्या दोषाचा शोध करणें, असें ह्मणावयाचें असल्यास खुशाल ह्मणावें.<noinclude></noinclude>
pnblafhnvfp1sstfrysim4bn74f7e0u
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१७०
104
112014
236419
2026-08-31T12:04:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236419
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४६ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>त्याचा घेर फारतर एका मैलाचा असेल. येथें एक सरोवर सुद्धां आहे. पण कोठें कँडीचें नयन- मनोहर सरोवर व कोठें हे सखल लांबट जागेंत सांठवलेल्या पाण्याचें सरोवर याचें सभोंवार फिरण्यास पायवाट नाहीं; याच्या बाजू बांधलेल्या नाहींत; याच्या दरेस शेवाळ, लव्हाळा व गवत वाढलेलें आहे. सारांश '''न्युवारा एलिया'''चें हें सरोवर पर्वतराजीच्या दरींत सहज साधलेलें साधें सरोवर आहे. त्याला मुद्दाम बांधलेल्या, नक्षीदार विटांच्या कठड्यानें सुशोभित केलेल्या, सभोंवार सुंदर पायवाटा ठेवलेल्या, व कँडीचा अद्वितीय अलंकार बनलेल्या सरोवराची सर कशी येणार? न्युवारा एलियाचें हें सरोवर नसून एक महाबळेश्वराच्या वेण्या तलावासारखा दरींत साधलेला तलाव आहे.
{{gap}}ज्याप्रमाणें पुण्यांतील उदबत्त्याचे दुकानदार ''''पुण्यांत म्हैसूर'''' अशी जाहिरात देतात; त्याप्रमाणें न्युवाराएलियाचें ''''लंकेत इंग्लंड'''' या दोन शब्दांत अन्वर्थक वर्णन करतां येईल. कारण येथे इंग्लंडसारखी थंडगार हवा आहे.
{{center|“धुकें धुके दाट धुकें लंडन शहरामाजी"}}
{{gap}}या कवितेच्या ओळींत वर्णन केल्याप्रमाणें धुकें आहे; येथेंही तिकडल्याप्रमाणें नेहमीं झीमझीम पाऊस पडतो. आरबी भाषेंतील गोष्टींतल्याप्रमाणें एखाद्या माणसास जादूच्या कांडीनें एकदम न्युवारा एलियांत आणून सोडलें तर हें ठिकाण विषुववृत्तानजीक असून उष्ण कटीबंधांतील बेटाच्या एका उंच पर्वतराजीवर आहे हे मुळींच कळणार नाहीं. थंड प्रदेशांतील सपाट व सखल भूभिभागांत वसलेलें हें एक छोटेखानी शहर आहे असें त्याला वाटेल. न्युवारा एलियाबद्दल अधिक लिहिण्यासारखें राहिलें नाहीं.
{{gap}}दुसरे दिवशीं सकाळीं न्याहारी करून विंडसर हॉटेलचे एका दिवसाचें साडेतीन रुपयांचें बिल चुकतें करून व सामानाचा बोजा रा. थंबी पिल्ले ओव्हरसीअरच्या माणसाच्या स्वाधीन करण्यास सांगून मी '''हगाला''' बाग<noinclude></noinclude>
q7w59c6xsyz0brjgopuuhfbyqoimt6j
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१७१
104
112015
236422
2026-08-31T12:13:35Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236422
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंका बेटांतील दोन शीतलनिवासस्थानें|१४७ }}</noinclude>पाहण्यास मेल मोटारबसनें आठ वाजतां निघालों. चार मैलांवर उजव्या बाजूस डोंगराच्या उतारावर अशोक वृक्षाची मोठी राई दिसली. डाव्या हातच्या ओढ्यामध्ये काळसर पाण्याचा छोटासा डोह दिसला.
{{gap}}येथल्या लोकांमध्यें प्रचलित असलेल्या दंतकथेप्रमाणें सीतेला रावणानें राहण्यास दिलेलें अशोकवनाचें ठिकाण हे होय. पण येथले अशोकवृक्ष आपण ज्यांना अशोकवृक्ष म्हणतो त्यासारखे मुळींच नाहींत. हे आपल्या अशोकासारखे सरळसोट वाढत नाहींत. ह्यांना आपल्या अशोक वृक्षासारखी बारिक लांबट करवती तजेलदार पानें नाहींत; हे अशोकवृक्ष कांहीं से खुजे, वांकडे तिकडे वाढणारे; पुष्कळ खांद्या असलेले पण एकंदर डौलदार दिसणारे वृक्ष आहेत; यांचीं खालच्या बाजूस किंचित् पांढरट तर वरच्या बाजूस काळसर हिरवटरंगाची जाडसर पानें आहेत; हें झाड कांहींसे कोंकणांतील काजूच्या झाडासारखें दुरून तरी दिसतें. पण या झाडाच्या फुलांची शोभा मात्र खरोखरीं अवर्णनीय आहे. या झाडांना वसंतऋतूंत फुलेंच फुलें येतात. त्यांचा रंग काळसर तांबड्या गुलाबाच्या फुलासारखा फार मनोहर आहे; पण रंगापेक्षां सुद्धां या पुष्पाची रचना विलक्षण नवलाची आहे. हें पुष्प नव्हें तर हा फुलांचा सुष्टिसुंदरीनें आपल्या नाजुक हातांनीं गुंफलेला एक पुष्पगुच्छ होय. कारण हे पुष्प म्हणजे तेरा पुष्पांचा एका देठावर वाढलेला पुष्प-समुदाय होय. त्याची रचना किती आश्चर्यकारक! या पुष्पाचे मधोमध एक फूल असतें व त्याचे सभोवार सहा सहा फुलांच्या दोन रांगा असतात; त्या अशा कीं मधलें फुल धरलें म्हणजे तीन तीन फुलांची एक उतरती ओळ अशा सहा ओळी होतात; म्हणजे वास्तविक तेराच फुलें या एका फुलांत असतांना आठरा फुलें असल्याचा भास होतो. या सर्व पुष्पांमिळून एकच देठ असतें व त्या देठाला दोन तीन पानें असतात. किती विलक्षण व आश्चर्यकारक ही फुलांची रचना! रावणाला सामान्य स्त्री हृदयाची उत्तम पारख असावी. कोणत्या स्त्रीला अशा अद्वितीय फुलांनी फुललेल्या उपवनांत राहण्यास आवडणार नाहीं? कोणत्या स्त्रीला हा<noinclude></noinclude>
nrerqvearue1jfm58n58ya8fj7n1ans
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१७२
104
112016
236423
2026-08-31T12:16:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236423
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>निसर्गनिर्मित पुष्पगुच्छ आपल्या केसांच्या खोप्यांत खोवावासा वाटणार नाहीं? कोणत्या स्त्रीला या सुंदर उपवनानजीक असलेल्या सुंदर ओढ्याच्या शीतलस्पर्श व शांतजल डोहांत स्नान करणें व जलक्रीडा करणें आवडणार नाहीं? रावणाने सीतेला जेव्हां या निसर्गरमणीय स्थानांतील अशोकवनांत ठेवण्याचे ठरविलें असेल त्यावेळी त्याला खात्रीनें वाटलें असेल कीं अशा सुंदर उपवनाचा व आपल्या राजवैभवाचा मोह सीतेस आवरणार नाहीं व ती आपल्यास खुषीनं वश होईल. पण सीता काय सामान्य स्त्री पडली? येथें रावणाचा कयास चुकला. सीतेसारख्या पतिव्रता स्त्रीला रावणाच्या संपत्तीचा, त्याच्या राजवैभवाचा किंवा सुंदर व निसर्ग रमणीय निवासस्थानाचा मोह पडला नाहीं. रावणाला सीतेला सारखी प्रतिबंधांत ठेवावी लागली व म्हणूनच रामाला वानरांचे साहाय्य घेऊन अलंघ्य समुद्रावर सेतू बांधून लंकेवर स्वारी करून रावणाचा वध करून सीतेची सुटका करावी लागली. याप्रमाणे येथें उभा असतांना मला लहानपणापासून परिचित असलेलें सर्व रामायण आठवलें.
{{gap}}अशा तऱ्हेचे मनोहर विचारतरंग मनांत उठत असल्यामुळे मला येथला निसर्गसुंदर पण साधा देखावा फारच आवडला व येथें आल्याबद्दल मला आनंदीआनंद झाला. या आनंदामध्यें किंचित् विरजण घालणारी गोष्ट म्हणजे रामरावणाची दंतकथा ही केवळ कविकल्पना कीं काय ही कुशंका होय. पण या कुशंकेची मनांतून हकालपट्टी करून आज आपण सीता निवासस्थान- अशोक वन- पाहिले अशा मनाच्या समाधानानें मी मार्गस्थ झालों व हगाला बागेच्या फाटकाजवळ मोटारींतून उतरलों. "परत जातांना मला घेऊन जा; मी पांच वाजल्यापासून येथें तुमच्या मेल मोटारची वाट पाहात राहीन" असें ड्रायव्हरला सांगून मी त्याचें चार आण्याचें भाडें देऊन बागेत प्रवेश केला.
{{gap}}हगाला बाग न्युवारा एलिया निवासस्थानापासून साहा साडेसहा मैलावर आहे. तो न्युवारा एलियाच्या सुमारें पांचशे फूट खालीं आहे. तो<noinclude></noinclude>
sav6jy2kdtmowfvjgbv5dewvtlrn8o7
236426
236423
2026-08-31T12:19:27Z
कल्पनाशक्ती
3813
236426
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४८ |लंकेचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>निसर्गनिर्मित पुष्पगुच्छ आपल्या केसांच्या खोप्यांत खोवावासा वाटणार नाहीं? कोणत्या स्त्रीला या सुंदर उपवनानजीक असलेल्या सुंदर ओढ्याच्या शीतलस्पर्श व शांतजल डोहांत स्नान करणें व जलक्रीडा करणें आवडणार नाहीं? रावणाने सीतेला जेव्हां या निसर्गरमणीय स्थानांतील अशोकवनांत ठेवण्याचे ठरविलें असेल त्यावेळी त्याला खात्रीनें वाटलें असेल कीं अशा सुंदर उपवनाचा व आपल्या राजवैभवाचा मोह सीतेस आवरणार नाहीं व ती आपल्यास खुषीनं वश होईल. पण सीता काय सामान्य स्त्री पडली? येथें रावणाचा कयास चुकला. सीतेसारख्या पतिव्रता स्त्रीला रावणाच्या संपत्तीचा, त्याच्या राजवैभवाचा किंवा सुंदर व निसर्ग रमणीय निवासस्थानाचा मोह पडला नाहीं. रावणाला सीतेला सारखी प्रतिबंधांत ठेवावी लागली व म्हणूनच रामाला वानरांचे साहाय्य घेऊन अलंघ्य समुद्रावर सेतू बांधून लंकेवर स्वारी करून रावणाचा वध करून सीतेची सुटका करावी लागली. याप्रमाणे येथें उभा असतांना मला लहानपणापासून परिचित असलेलें सर्व रामायण आठवलें.
{{gap}}अशा तऱ्हेचे मनोहर विचारतरंग मनांत उठत असल्यामुळे मला येथला निसर्गसुंदर पण साधा देखावा फारच आवडला व येथें आल्याबद्दल मला आनंदीआनंद झाला. या आनंदामध्यें किंचित् विरजण घालणारी गोष्ट म्हणजे रामरावणाची दंतकथा ही केवळ कविकल्पना कीं काय ही कुशंका होय. पण या कुशंकेची मनांतून हकालपट्टी करून आज आपण सीता निवासस्थान- अशोक वन- पाहिले अशा मनाच्या समाधानानें मी मार्गस्थ झालों व हगाला बागेच्या फाटकाजवळ मोटारींतून उतरलों. "परत जातांना मला घेऊन जा; मी पांच वाजल्यापासून येथें तुमच्या मेल मोटारची वाट पाहात राहीन" असें ड्रायव्हरला सांगून मी त्याचें चार आण्याचें भाडें देऊन बागेत प्रवेश केला.
{{gap}}हगाला बाग न्युवारा एलिया निवासस्थानापासून साहा साडेसहा मैलावर आहे. तो न्युवारा एलियाच्या सुमारें पांचशे फूट खालीं आहे. तो{{nop}}<noinclude></noinclude>
mj1uoaznrgo3s5ns8fguo3bovkuq389
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१७३
104
112017
236425
2026-08-31T12:19:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "
{{center|'''हगाला बागेचें प्रवेशद्वार.'''}} {{rh|नं. १८||पान १४८}} {{nop}}"
236425
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|'''हगाला बागेचें प्रवेशद्वार.'''}}
{{rh|नं. १८||पान १४८}}
{{nop}}<noinclude></noinclude>
o6b3s7t32cjndjt65syb85976367axe
पान:लंकेचे वर्णन व वृतांत.pdf/१७४
104
112018
236427
2026-08-31T12:25:07Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
236427
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||लंका बेटांतील दोन शीतलनिवासस्थानें|१४९ }}</noinclude>हगाला खडक नांवाच्या खांबासारख्या उभ्या डोंगराचे पायथ्याशीं असून या पर्वतराजीचे टोकाला आहे. यामुळें येथून खालचा सपाट प्रदेश एकदम दृग्गोचर होतो. बागेच्या प्रारंभीं सायप्रस वृक्षांची रस्त्याच्या दोन्ही बाजूंची रांग मोठी सुंदर दिसते. वृक्ष मोठमोठे वाढलेले असल्यामुळे बागेंत शिरल्याबरोबर खूप गर्दछाय रस्ता लागतो व हवा थंडगार वाटते. या बागेच्या फाटकाच्या खांबावर १८६१ हा बागस्थापनेचा सन खोदून ठेवला आहे. हा बाग पेरेडॅनीया बागेच्यामागून स्थापन झालेला आहे व त्या बागेपेक्षां हा लहान आहे. बागेचा तयार केलेला भाग ५६ एकरांचा आहे. तरी पण बागेच्या ताब्यांतील एकंदर जागा ५०० एकरांच्यावर आहे. पण त्यामध्यें आपोआप झालेलें जंगल व जंगली झाडें आहेत; या भागांत निरनिराळ्या झाडांची लागवड प्रयोगादाखल चालू आहे. मला पुष्कळ वेळ असल्यामुळे मी सर्व बाग सावकाशपणें व स्वस्थपणें पाहिली; लागवडीच्या भागाबाहेरील रानवजा भागांतही जाऊन आलों. 'हगाला खडकाकडे' अशी पाटी मी पाहिली. पण श्रीपादशिखर नुकतेंच पाहिलें होतें; शिवाय मिहिंतले दांबूल व सीगीरिया इत्यादि दुर्गम खडकावरील प्रेक्षणीय स्थळें पाहिल्यावर या हगाला खडकाच्या माथ्यावर जाण्याची मला इच्छा व उत्साह वाटला नाहीं. म्हणून मी वर न चढतां रानांत व अशोकांची झाडें पहात थोडासा हिंडलों. मग लागवड केलेल्या भागांत परत आलों. या बागेला पाण्याचा पुरवठा फार मोठा आहे. कारण हगाला खडकाच्या पर्वतराजीकडून मोठा थोरला एक ओढा बागेच्या जागेतून जातो. यामुळें त्या ओढ्याच्या पाटानें या बागेला हवे तितकें पाणी मिळतें; बागेंत जिकडे तिकडे पाटाचें पाणी झुळूझुळू वाहतांना दिसत होतें; "पवनचपल पाटाचें पाणी झुळू झुळू वाहे तरुमुलांतुनी" हें आण्णा किर्लोस्करांनीं केलेल्या कालिदासाच्या श्लोकाचें रूपांतर मला आठवलें व कालिदास कवीच्या यथार्थ सृष्टिनिरीक्षणाचे व पाहिलेल्या गोष्टींचें सुंदर शब्दांनीं वर्णन करण्याच्या कुशलतेचें कौतुक वाटलें.{{nop}}<noinclude></noinclude>
ighb5img6fbw23snv8lr97tclzkjv0b
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१०१
104
112019
236429
2026-08-31T12:30:18Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ (८९) एक शंका. , येथे अशी एक शंका उद्भवण्याचा संभव आहे कीं, अनपेक्षितपणा आणि विसंगतपणा यांत फरक कोणता ! विसंगत ह्मणजेच अनपेक्षित नव्हे काय ? अनपेक्षित आणि विसंगत हीं जर एकच आहे..."
236429
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
(८९)
एक शंका.

येथे अशी एक शंका उद्भवण्याचा संभव आहे कीं, अनपेक्षितपणा आणि विसंगतपणा यांत फरक कोणता ! विसंगत ह्मणजेच अनपेक्षित नव्हे काय ? अनपेक्षित आणि विसंगत हीं जर एकच आहेत, तर विनोदाचा उद्देश हंसविर्णे नव्हे असें प्रतिपादन करतांनां, निव्वळ अनपेक्षित म्हणून पुष्कळ हँसें येतें असें ह्मणून, नंतर विनोदाचे मूळ विसंगतपणांत आहे असें सिद्ध करणे, ह्मणजे हात- चलाखीच्या खेळासारखे होत नाहीं काय ! नुसता शब्द बदलला, अनपेक्षि ताच्या बदलांत विसंगत हा शब्द वापरला कीं, झणणे खरें होतें काय ? ही शंका महत्वाची आहे; आणि जोपर्यंत अनपेक्षित व विसंगत यांतला फरक ध्यानांत येणार नाहीं, तोपर्यंत विनोदाविषयींच्या कल्पनाहि अस्पष्ट राहतील हे उघड आहे. आतां शंकेचें समाधान कसें करावयाचें तें पाहूं.
7
लहान मुलांनां सर्वच अनपेक्षित असतें, रानटी लोकांची तशी स्थिति आहे रानवट, अर्धवट लोकांना अनपेक्षित कमी असतें. त्याहिपेक्षां सुधारलेल्या लो- कांनां कमी, व त्यांच्यांत देखील जाणत्यांनां फारच कमी, अशी परंपरा लागते. मागल्या शतकांत झालेल्या शास्त्रांच्या अपूर्व वाढीमुळे तर अनपेक्षिताचें क्षेत्र बरेंच संकुचित झालेलें आपणाला दिसतें; व जसजशी ज्ञानवृद्धि होईल, तसतसें हैं क्षेत्र दल्लींपेक्षाहि कमी होत जाईल. कारण वय, अनुभव, शिक्षण, ज्ञान व संस्कार, यांच्यावर अनपेक्षिताचा विस्तार अवलंबून आहे. सर्वज्ञाला कांहींच अन- पेक्षित नाही. पण विसंगताची तशी गोष्ट नाहीं. जितका मनुष्य जाणता अधिक, जितकी त्याची दृष्टि सूक्ष्म अधिक तितकें त्याचें विसंगताचे ज्ञान अधिक. कारण विसंगत हा भिन्न वस्तूंच्या एकत्र मिळण्याचा परिणाम आहे. अनपेक्षिताप्रमाणे अज्ञानाचा परिणाम नाहीं. मनुष्य कितीहि जाणता झाला, तरी विसंगताचा पुरता निरास होणे अशक्य आहे. यास्तव, विसंगताचें मूळ मनुष्यस्वभावांत सर्वत्र कसे पसरले आहे, त्याचे विवेचन विस्ताराने करणें भाग पडले आहे. विसंगतपणा आणि मनुष्यत्व यांचा, एक आहे तर दुसरें आहें, एक नाहीं तर दुसरेंहि नाहीं असा संबंध असल्यामुळे, विसंगतपणाची जाणीव ही विनोदाची पहिली खूण, असें आह्मीं झटलें आहे. अनपेक्षित व विसंगत यांच्या भिन्नतेबद्दल यापेक्षां येथें अधिक खल करणे शक्य नाहीं. असो.<noinclude></noinclude>
bmvc4rzyx30u2gk4fk80g2uv3a0wuui
236441
236429
2026-09-01T05:35:31Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
236441
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८९)'''}}}}</noinclude>
{{center|{{larger|'''एक शंका.'''}}}}
{{gap}}येथे अशी एक शंका उद्भवण्याचा संभव आहे कीं, अनपेक्षितपणा आणि विसंगतपणा यांत फरक कोणता! विसंगत ह्मणजेच अनपेक्षित नव्हे काय? अनपेक्षित आणि विसंगत हीं जर एकच आहेत, तर विनोदाचा उद्देश हंसविणे नव्हे असें प्रतिपादन करतांनां, निव्वळ अनपेक्षित म्हणून पुष्कळ हंसें येतें असें ह्मणून, नंतर विनोदाचे मूळ विसंगतपणांत आहे असें सिद्ध करणे, ह्मणजे हातचलाखीच्या खेळासारखे होत नाहीं काय! नुसता शब्द बदलला, अनपेक्षिताच्या बदलांत विसंगत हा शब्द वापरला कीं,म्हणणे खरें होतें काय? ही शंका महत्वाची आहे; आणि जोपर्यंत '''अनपेक्षित व विसंगत''' यांतला फरक ध्यानांत येणार नाहीं, तोपर्यंत विनोदाविषयींच्या कल्पनाहि अस्पष्ट राहतील हे उघड आहे. आतां शंकेचें समाधान कसें करावयाचें तें पाहूं.

{{gap}}लहान मुलांनां सर्वच अनपेक्षित असतें, रानटी लोकांची तशी स्थिति आहे रानवट, अर्धवट लोकांना अनपेक्षित कमी असतें. त्याहिपेक्षां सुधारलेल्या लोकांनां कमी, व त्यांच्यांत देखील जाणत्यांनां फारच कमी, अशी परंपरा लागते. मागल्या शतकांत झालेल्या शास्त्रांच्या अपूर्व वाढीमुळे तर अनपेक्षिताचें क्षेत्र बरेंच संकुचित झालेलें आपणाला दिसतें; व जसजशी ज्ञानवृद्धि होईल, तसतसें हे क्षेत्र हल्लींपेक्षाहि कमी होत जाईल. कारण वय, अनुभव, शिक्षण, ज्ञान व संस्कार, यांच्यावर अनपेक्षिताचा विस्तार अवलंबून आहे. सर्वज्ञाला कांहींच अनपेक्षित नाही. पण विसंगताची तशी गोष्ट नाहीं. जितका मनुष्य जाणता अधिक, जितकी त्याची दृष्टि सूक्ष्म अधिक तितकें त्याचें विसंगताचे ज्ञान अधिक. '''कारण विसंगत हा भिन्न वस्तूंच्या एकत्र मिळण्याचा परिणाम आहे. अनपेक्षिताप्रमाणे अज्ञानाचा परिणाम नाहीं.''' मनुष्य कितीहि जाणता झाला, तरी विसंगताचा पुरता निरास होणे अशक्य आहे. यास्तव, विसंगताचें मूळ मनुष्यस्वभावांत सर्वत्र कसे पसरले आहे, त्याचे विवेचन विस्ताराने करणें भाग पडले आहे. विसंगतपणा आणि मनुष्यत्व यांचा, एक आहे तर दुसरें आहें, एक नाहीं तर दुसरेंहि नाहीं असा संबंध असल्यामुळे, विसंगतपणाची जाणीव ही विनोदाची पहिली खूण, असें आह्मीं म्हटलें आहे. अनपेक्षित व विसंगत यांच्या भिन्नतेबद्दल यापेक्षां येथें अधिक खल करणे शक्य नाहीं. असो.<noinclude></noinclude>
5syj5zql3vaaqpqeximps5ixgiol4z2
236445
236441
2026-09-01T05:48:18Z
JayashreeVI
4058
236445
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(८९)'''}}}}</noinclude>{{center|{{larger|'''एक शंका.'''}}}}
{{gap}}येथे अशी एक शंका उद्भवण्याचा संभव आहे कीं, अनपेक्षितपणा आणि विसंगतपणा यांत फरक कोणता! विसंगत ह्मणजेच अनपेक्षित नव्हे काय? अनपेक्षित आणि विसंगत हीं जर एकच आहेत, तर विनोदाचा उद्देश हंसविणे नव्हे असें प्रतिपादन करतांनां, निव्वळ अनपेक्षित म्हणून पुष्कळ हंसें येतें असें ह्मणून, नंतर विनोदाचे मूळ विसंगतपणांत आहे असें सिद्ध करणे, ह्मणजे हातचलाखीच्या खेळासारखे होत नाहीं काय! नुसता शब्द बदलला, अनपेक्षिताच्या बदलांत विसंगत हा शब्द वापरला कीं,म्हणणे खरें होतें काय? ही शंका महत्वाची आहे; आणि जोपर्यंत '''अनपेक्षित व विसंगत''' यांतला फरक ध्यानांत येणार नाहीं, तोपर्यंत विनोदाविषयींच्या कल्पनाहि अस्पष्ट राहतील हे उघड आहे. आतां शंकेचें समाधान कसें करावयाचें तें पाहूं.

{{gap}}लहान मुलांनां सर्वच अनपेक्षित असतें, रानटी लोकांची तशी स्थिति आहे रानवट, अर्धवट लोकांना अनपेक्षित कमी असतें. त्याहिपेक्षां सुधारलेल्या लोकांनां कमी, व त्यांच्यांत देखील जाणत्यांनां फारच कमी, अशी परंपरा लागते. मागल्या शतकांत झालेल्या शास्त्रांच्या अपूर्व वाढीमुळे तर अनपेक्षिताचें क्षेत्र बरेंच संकुचित झालेलें आपणाला दिसतें; व जसजशी ज्ञानवृद्धि होईल, तसतसें हे क्षेत्र हल्लींपेक्षाहि कमी होत जाईल. कारण वय, अनुभव, शिक्षण, ज्ञान व संस्कार, यांच्यावर अनपेक्षिताचा विस्तार अवलंबून आहे. सर्वज्ञाला कांहींच अनपेक्षित नाही. पण विसंगताची तशी गोष्ट नाहीं. जितका मनुष्य जाणता अधिक, जितकी त्याची दृष्टि सूक्ष्म अधिक तितकें त्याचें विसंगताचे ज्ञान अधिक. '''कारण विसंगत हा भिन्न वस्तूंच्या एकत्र मिळण्याचा परिणाम आहे. अनपेक्षिताप्रमाणे अज्ञानाचा परिणाम नाहीं.''' मनुष्य कितीहि जाणता झाला, तरी विसंगताचा पुरता निरास होणे अशक्य आहे. यास्तव, विसंगताचें मूळ मनुष्यस्वभावांत सर्वत्र कसे पसरले आहे, त्याचे विवेचन विस्ताराने करणें भाग पडले आहे. विसंगतपणा आणि मनुष्यत्व यांचा, एक आहे तर दुसरें आहें, एक नाहीं तर दुसरेंहि नाहीं असा संबंध असल्यामुळे, विसंगतपणाची जाणीव ही विनोदाची पहिली खूण, असें आह्मीं म्हटलें आहे. अनपेक्षित व विसंगत यांच्या भिन्नतेबद्दल यापेक्षां येथें अधिक खल करणे शक्य नाहीं. असो.<noinclude></noinclude>
pbk0ydnyr1y7pn3qm9v95usvlk6pkjd
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१०२
104
112020
236430
2026-08-31T12:30:50Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ९० ) विनोदाच्या विकृती. आतांपर्यंत झालेल्या विवेचनावरून विनोद ह्मणजे काय, त्याचा उद्देश को- णता, हें वाचकांच्या लक्षात आलेच असेल. विनोदाच्या विकृति ह्मणजे दूषित रूपें को..."
236430
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
( ९० )
विनोदाच्या विकृती.
आतांपर्यंत झालेल्या विवेचनावरून विनोद ह्मणजे काय, त्याचा उद्देश को- णता, हें वाचकांच्या लक्षात आलेच असेल. विनोदाच्या विकृति ह्मणजे दूषित रूपें कोणतीं, त्यांची अधिक शहानिशा करण्याची अजून जरूर असल्यामुळे तसे करणे अपरिहार्य आहे.

विनोदाचा उद्देश इंसविणें कां मानतां येत नाहीं, हें दाखवितांना सरकस- तल्या मस्क-याचे चाळे, नटांचे अस्वाभाविक अंगविक्षेप चेहरेपालट, आवाजाचे अनियमित फेरबदल, इत्यादि विकृतींचा निर्देश झाला आहे. शेरिडनच्या ' Rivals ' या नाटकांत Mrs Malaprop है पात्र आहे, या बाईची बोलण्याची अशी तन्हा आहे, कीं साधारण समान उच्चाराचे दोन शब्द असले, तर त्यांपैकी जो लागू नसेल, तोच वापरावयाचा. उदाहरणार्थ:--' aligators- of the Nile ' असें न झणतांना 'allegories of the Nile अर्से ह्मणावयाचें. भलताच शब्द वापरल्यामुळे कांहींच अर्थ न निघून, या विचित्र बोलण्याचें हंसें येतें. पण यांत विनोद कोणता, तें सांगणें सोपें नाहीं. नुसतें इंसवावयाला युक्ति चांगली आहे इतकेच. तसेंच Smollett च्या एका कादं- बरींत, इंग्रजी भाषेतले अक्षरसमूह -- Spelling व त्यांचा उच्चार, यांमधल्या विलक्षण फरकांचा फायदा घेऊन एका पात्राकडून व्यवहारांतल्या शब्दांचं शक्य तितकें वेडेवाकडे स्पेलिंग करून दाखविलें आहे. असल्या अपरिचित स्पेलिंगा- मुळे थोडीशी करमणूक होते, पण त्याला खरा विनोद ह्मणतां येत नाही.
विनोदाला केवळ वेळ घालविण्याचे साधन बनविल्यामुळे कोणतीं दूषित रूपें उत्पन्न होतात, तें आता पाहूं. राजेरजवाड्यांच्या आश्रयाला त्यांची करम- णूक करण्याकरिता, वेळ घालविण्याकरितां, एक स्वतंत्र माणूस असे, व त्याला खुषमस्कऱ्या झणत असत. कालिदासाच्या नाटकांतला विदूषक व मृच्छक टिकांतला मैत्रेय हे याच वर्गातले होत. यूरोपांत त्याला — Fool ' ह्मणत असत, व त्याचा पोषाखहि निराळाच असे. वासुदेवासारखी उंच टोंक अस- लेली, लहान घंटा लाविलेली, एक टोपी, व एक मोठा खुळखुळा, असा त्याचा थाट असे. खुषमस्कऱ्याला वाटेल ते बोलण्याची मुभा असे. दरबारतिले बोलण्याचे किंवा वागण्याचे निर्बंध त्याला लागू नसत. त्याला स्वतःला अपाय<noinclude></noinclude>
ozkwox5mketflwd4w8p5uk3gsxih9or
236442
236430
2026-09-01T05:46:50Z
JayashreeVI
4058
236442
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(९०)'''}}}}</noinclude>
{{center|{{larger|'''विनोदाच्या विकृती.'''}}}}
{{gap}}आतांपर्यंत झालेल्या विवेचनावरून विनोद ह्मणजे काय, त्याचा उद्देश कोणता, हें वाचकांच्या लक्षात आलेच असेल. विनोदाच्या विकृति ह्मणजे दूषित रूपें कोणतीं, त्यांची अधिक शहानिशा करण्याची अजून जरूर असल्यामुळे तसे करणे अपरिहार्य आहे.

{{gap}}विनोदाचा उद्देश हसविणें कां मानतां येत नाहीं, हें दाखवितांना सरकशीतल्या मस्क-याचे चाळे, नटांचे अस्वाभाविक अंगविक्षेप चेहरेपालट, आवाजाचे अनियमित फेरबदल, इत्यादि विकृतींचा निर्देश झाला आहे. शेरिडनच्या 'Rivals' या नाटकांत Mrs Malaprop है पात्र आहे, या बाईची बोलण्याची अशी त-हा आहे, कीं साधारण समान उच्चाराचे दोन शब्द असले, तर त्यांपैकी जो लागू नसेल, तोच वापरावयाचा. उदाहरणार्थ:-'aligators- of the Nile' असें न म्हणतांना 'allegories of the Nile' असे ह्मणावयाचें. भलताच शब्द वापरल्यामुळे कांहींच अर्थ न निघून, या विचित्र बोलण्याचें हंसें येतें. पण यांत विनोद कोणता, तें सांगणें सोपें नाहीं. नुसतें हसवावयाला युक्ति चांगली आहे इतकेच. तसेंच Smollett च्या एका कादंबरींत, इंग्रजी भाषेतले अक्षरसमूह -Spelling- व त्यांचा उच्चार, यांमधल्या विलक्षण फरकांचा फायदा घेऊन एका पात्राकडून व्यवहारांतल्या शब्दांचं शक्य तितकें वेडेवाकडे स्पेलिंग करून दाखविलें आहे. असल्या अपरिचित स्पेलिंगामुळे थोडीशी करमणूक होते, पण त्याला खरा विनोद ह्मणतां येत नाही.

{{gap}}विनोदाला केवळ वेळ घालविण्याचे साधन बनविल्यामुळे कोणतीं दूषित रूपें उत्पन्न होतात, तें आता पाहूं. राजेरजवाड्यांच्या आश्रयाला त्यांची करमणूक करण्याकरिता, वेळ घालविण्याकरितां, एक स्वतंत्र माणूस असे, व त्याला खुषमस्कऱ्या म्हणत असत. कालिदासाच्या नाटकांतला विदूषक व मृच्छक टिकांतला मैत्रेय हे याच वर्गातले होत. यूरोपांत त्याला 'Fool' ह्मणत असत, व त्याचा पोषाखहि निराळाच असे. वासुदेवासारखी उंच टोंक असलेली, लहान घंटा लाविलेली, एक टोपी, व एक मोठा खुळखुळा, असा त्याचा थाट असे. खुषमस्कऱ्याला वाटेल ते बोलण्याची मुभा असे. दरबारतिले बोलण्याचे किंवा वागण्याचे निर्बंध त्याला लागू नसत. त्याला स्वतःला अपाय<noinclude></noinclude>
l32v2j80kb8zq16h1d2mwmbsf5moqr7
236443
236442
2026-09-01T05:47:20Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
236443
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(९०)'''}}}}</noinclude>
{{center|{{larger|'''विनोदाच्या विकृती.'''}}}}
{{gap}}आतांपर्यंत झालेल्या विवेचनावरून विनोद ह्मणजे काय, त्याचा उद्देश कोणता, हें वाचकांच्या लक्षात आलेच असेल. विनोदाच्या विकृति ह्मणजे दूषित रूपें कोणतीं, त्यांची अधिक शहानिशा करण्याची अजून जरूर असल्यामुळे तसे करणे अपरिहार्य आहे.

{{gap}}विनोदाचा उद्देश हसविणें कां मानतां येत नाहीं, हें दाखवितांना सरकशीतल्या मस्क-याचे चाळे, नटांचे अस्वाभाविक अंगविक्षेप चेहरेपालट, आवाजाचे अनियमित फेरबदल, इत्यादि विकृतींचा निर्देश झाला आहे. शेरिडनच्या 'Rivals' या नाटकांत Mrs Malaprop है पात्र आहे, या बाईची बोलण्याची अशी त-हा आहे, कीं साधारण समान उच्चाराचे दोन शब्द असले, तर त्यांपैकी जो लागू नसेल, तोच वापरावयाचा. उदाहरणार्थ:-'aligators- of the Nile' असें न म्हणतांना 'allegories of the Nile' असे ह्मणावयाचें. भलताच शब्द वापरल्यामुळे कांहींच अर्थ न निघून, या विचित्र बोलण्याचें हंसें येतें. पण यांत विनोद कोणता, तें सांगणें सोपें नाहीं. नुसतें हसवावयाला युक्ति चांगली आहे इतकेच. तसेंच Smollett च्या एका कादंबरींत, इंग्रजी भाषेतले अक्षरसमूह -Spelling- व त्यांचा उच्चार, यांमधल्या विलक्षण फरकांचा फायदा घेऊन एका पात्राकडून व्यवहारांतल्या शब्दांचं शक्य तितकें वेडेवाकडे स्पेलिंग करून दाखविलें आहे. असल्या अपरिचित स्पेलिंगामुळे थोडीशी करमणूक होते, पण त्याला खरा विनोद ह्मणतां येत नाही.

{{gap}}विनोदाला केवळ वेळ घालविण्याचे साधन बनविल्यामुळे कोणतीं दूषित रूपें उत्पन्न होतात, तें आता पाहूं. राजेरजवाड्यांच्या आश्रयाला त्यांची करमणूक करण्याकरिता, वेळ घालविण्याकरितां, एक स्वतंत्र माणूस असे, व त्याला खुषमस्कऱ्या म्हणत असत. कालिदासाच्या नाटकांतला विदूषक व मृच्छक टिकांतला मैत्रेय हे याच वर्गातले होत. यूरोपांत त्याला 'Fool' ह्मणत असत, व त्याचा पोषाखहि निराळाच असे. वासुदेवासारखी उंच टोंक असलेली, लहान घंटा लाविलेली, एक टोपी, व एक मोठा खुळखुळा, असा त्याचा थाट असे. खुषमस्कऱ्याला वाटेल ते बोलण्याची मुभा असे. दरबारतिले बोलण्याचे किंवा वागण्याचे निर्बंध त्याला लागू नसत. त्याला स्वतःला अपाय<noinclude></noinclude>
jcr0vsrmvdd52np8d6wlo88jv8puyi7
236444
236443
2026-09-01T05:47:45Z
JayashreeVI
4058
236444
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(९०)'''}}}}</noinclude>{{center|{{larger|'''विनोदाच्या विकृती.'''}}}}
{{gap}}आतांपर्यंत झालेल्या विवेचनावरून विनोद ह्मणजे काय, त्याचा उद्देश कोणता, हें वाचकांच्या लक्षात आलेच असेल. विनोदाच्या विकृति ह्मणजे दूषित रूपें कोणतीं, त्यांची अधिक शहानिशा करण्याची अजून जरूर असल्यामुळे तसे करणे अपरिहार्य आहे.

{{gap}}विनोदाचा उद्देश हसविणें कां मानतां येत नाहीं, हें दाखवितांना सरकशीतल्या मस्क-याचे चाळे, नटांचे अस्वाभाविक अंगविक्षेप चेहरेपालट, आवाजाचे अनियमित फेरबदल, इत्यादि विकृतींचा निर्देश झाला आहे. शेरिडनच्या 'Rivals' या नाटकांत Mrs Malaprop है पात्र आहे, या बाईची बोलण्याची अशी त-हा आहे, कीं साधारण समान उच्चाराचे दोन शब्द असले, तर त्यांपैकी जो लागू नसेल, तोच वापरावयाचा. उदाहरणार्थ:-'aligators- of the Nile' असें न म्हणतांना 'allegories of the Nile' असे ह्मणावयाचें. भलताच शब्द वापरल्यामुळे कांहींच अर्थ न निघून, या विचित्र बोलण्याचें हंसें येतें. पण यांत विनोद कोणता, तें सांगणें सोपें नाहीं. नुसतें हसवावयाला युक्ति चांगली आहे इतकेच. तसेंच Smollett च्या एका कादंबरींत, इंग्रजी भाषेतले अक्षरसमूह -Spelling- व त्यांचा उच्चार, यांमधल्या विलक्षण फरकांचा फायदा घेऊन एका पात्राकडून व्यवहारांतल्या शब्दांचं शक्य तितकें वेडेवाकडे स्पेलिंग करून दाखविलें आहे. असल्या अपरिचित स्पेलिंगामुळे थोडीशी करमणूक होते, पण त्याला खरा विनोद ह्मणतां येत नाही.

{{gap}}विनोदाला केवळ वेळ घालविण्याचे साधन बनविल्यामुळे कोणतीं दूषित रूपें उत्पन्न होतात, तें आता पाहूं. राजेरजवाड्यांच्या आश्रयाला त्यांची करमणूक करण्याकरिता, वेळ घालविण्याकरितां, एक स्वतंत्र माणूस असे, व त्याला खुषमस्कऱ्या म्हणत असत. कालिदासाच्या नाटकांतला विदूषक व मृच्छक टिकांतला मैत्रेय हे याच वर्गातले होत. यूरोपांत त्याला 'Fool' ह्मणत असत, व त्याचा पोषाखहि निराळाच असे. वासुदेवासारखी उंच टोंक असलेली, लहान घंटा लाविलेली, एक टोपी, व एक मोठा खुळखुळा, असा त्याचा थाट असे. खुषमस्कऱ्याला वाटेल ते बोलण्याची मुभा असे. दरबारतिले बोलण्याचे किंवा वागण्याचे निर्बंध त्याला लागू नसत. त्याला स्वतःला अपाय<noinclude></noinclude>
c0abv8zbun7i2ami8k727xwv6if8c34
सदस्य चर्चा:BAPU UTTAM SATHE
3
112021
236440
2026-09-01T01:29:48Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
236440
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=BAPU UTTAM SATHE}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) ०६:५९, १ सप्टेंबर २०२६ (IST)
153el38juecgqc5rhrhavdltbgdao1e
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१०३
104
112022
236446
2026-09-01T05:49:15Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ९१ ) होण्याची फारशी भीति नसल्यामुळे तो सर्वोवर, कधीकधीं यजमानावर देखील वाग्बाण सोडण्यास कचरत नसे. दरबारांतल्या मोठमोठ्या मंडळीचाहि पोकळ डौल, त्यांची बढाई, त्यांचा भोंद..."
236446
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
( ९१ )
होण्याची फारशी भीति नसल्यामुळे तो सर्वोवर, कधीकधीं यजमानावर देखील वाग्बाण सोडण्यास कचरत नसे. दरबारांतल्या मोठमोठ्या मंडळीचाहि पोकळ डौल, त्यांची बढाई, त्यांचा भोंदुपणा, गुप्तद्वेष, वगैरे चवाट्यावर आणण्याची संधि मिळाल्यामुळे विनोदाचीं शुद्ध रूपें खुषमस्कऱ्याला व्यक्त करता येत असत यति संशय नाहीं. ' Ivanhoe' मधला Cedric याच्या किल्ल्यांतला रात्रींच्या भोजनाचा प्रसंग पहा. Palestine मध्ये कोण काय केलें, याचें फुशारकीचे वर्णन एक योद्धा जेव्हां करूं लागतो, तेव्हां Wamba च्या तोंडां- तून मार्मिक उद्गार काढवून Crusades चा निरर्थकपणा Scott कसा खुबीनें दाखवितो, तें वाचण्यासारखें आहे. पन्नास वर्षे टिकणारा एक तह आमच्या बहादुरीने आह्मीं दुष्मनांना करावयाला लावला, अशा अर्थाची चढाई ऐकून Wamba क्षणतो तर मग मी दीडशे वर्षांचा निदान असलों पाहिजे ! " त्याच्या ह्मणण्याचा अर्थ काय, तें न समजल्यामुळे " तें कसें ?" ह्मणून त्याला विचारताच तो क्षणतो, " तुझला इतकें का समजत नाहीं ? हे शिपाई गढी ह्मणतात, पन्नास वर्षे टिकणारा एक तह मोठ्या बहादुरीने शत्रूंकडून आपण करून घेतला. मी तर हा धरून पन्नास वर्षे टिकणारे तीन तह ऐकिले आहेत ! तेव्हां मला निदान दीडशे वर्षे तरी झाली नसली पाहिजेत काय १ " तांचा पोकळपणा त्याने किती उत्कृष्ट दाखविला पहा !
64
1
पण यजमानाचें मनोरंजन करावयाचें, त्याला कंटाळा वाहूं द्यावयाचा नाहीं, एवढेंच खुषमस्कऱ्याचे काम असल्यामुळे, शुद्ध रूपापेक्षां विकृतीकडे त्याची ओढ जास्त असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाहीं. विनोद ही एक प्रका- रची दृष्टि आहे, असें वर सांगितलेच आहे. ही विशेष प्रकारची दृष्टि शाबूत राहण्यास अनुभव, विद्वत्ता, कल्पनाशक्ति, शोधकवुद्धि व कळकळ हीं पाहिजेत. हे उच्च संस्कार मनाला झाले नसल्यास, आणि होऊन ते तसेच कायम न राहि- ल्यास, ही दृष्टि मंदावेल. कालांतरानें नाहींशीदेखील होईल. खुषमस्कऱ्याला हे आवश्यक संस्कार बेताचेच असल्यामुळे, वरवर दिसणारे दोष, शरीराचीं व्यंगें शरीराचे कांहीं नैसर्गिक व्यापार, स्त्रीपुरुषांचे कांहीं व्यवहार, यांकडे दृष्टि वळ- वून, कांहीतरी करून, अन्नदात्याचे मन रिझविण्याचा त्याने प्रयत्न केल्यास नवल नाहीं. गोंधळ्यांचा विनोद एकदा ऐकला, कीं, पुनः ऐकावयास जाण्याची इच्छा होत नाहीं, याचे कारण हेंच आहे. खुषमस्करे व गोंधळी यांची गोष्ठ<noinclude></noinclude>
ppjs3psdt7at1c2sjljgem46wueaiov
236447
236446
2026-09-01T06:00:27Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
236447
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(९१)'''}}}}</noinclude>होण्याची फारशी भीति नसल्यामुळे तो सर्वांवर, कधीकधीं यजमानावर देखील वाग्बाण सोडण्यास कचरत नसे. दरबारांतल्या मोठमोठ्या मंडळीचाहि पोकळ डौल, त्यांची बढाई, त्यांचा भोंदुपणा, गुप्तद्वेष, वगैरे चवाट्यावर आणण्याची संधि मिळाल्यामुळे विनोदाचीं शुद्ध रूपें खुषमस्कऱ्याला व्यक्त करता येत असत यात संशय नाहीं. 'Ivanhoe' मधला Cedric याच्या किल्ल्यांतला रात्रींच्या भोजनाचा प्रसंग पहा. Palestine मध्ये कोण काय केलें, याचें फुशारकीचे वर्णन एक योद्धा जेव्हां करूं लागतो, तेव्हां Wamba च्या तोंडांतून मार्मिक उद्गार काढवून Crusades चा निरर्थकपणा Scott कसा खुबीनें दाखवितो, तें वाचण्यासारखें आहे. पन्नास वर्षे टिकणारा एक तह आमच्या बहादुरीने आह्मीं दुष्मनांना करावयाला लावला, अशा अर्थाची चढाई ऐकून Wamba म्हणतो "तर मग मी दीडशे वर्षांचा निदान असलों पाहिजे!" त्याच्या ह्मणण्याचा अर्थ काय, तें न समजल्यामुळे "तें कसें ?" ह्मणून त्याला विचारताच तो म्हणतो, "तुम्हाला इतकें का समजत नाहीं? हे शिपाई गडी ह्मणतात, पन्नास वर्षे टिकणारा एक तह मोठ्या बहादुरीने शत्रूंकडून आपण करून घेतला. मी तर हा धरून पन्नास वर्षे टिकणारे तीन तह ऐकिले आहेत! तेव्हां मला निदान दीडशे वर्षे तरी झाली नसली पाहिजेत काय?" तहांचा पोकळपणा त्याने किती उत्कृष्ट दाखविला पहा!

{{gap}}पण यजमानाचें मनोरंजन करावयाचें, त्याला कंटाळा वाटू द्यावयाचा नाहीं, एवढेंच खुषमस्कऱ्याचे काम असल्यामुळे, शुद्ध रूपापेक्षां विकृतीकडे त्याची ओढ जास्त असल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाहीं. विनोद ही एक प्रकारची दृष्टि आहे, असें वर सांगितलेच आहे. ही विशेष प्रकारची दृष्टि शाबूत राहण्यास अनुभव, विद्वत्ता, कल्पनाशक्ति, शोधकबुद्धि व कळकळ हीं पाहिजेत. हे उच्च संस्कार मनाला झाले नसल्यास, आणि होऊन ते तसेच कायम न राहिल्यास, ही दृष्टि मंदावेल. कालांतरानें नाहींशीदेखील होईल. खुषमस्कऱ्याला हे आवश्यक संस्कार बेताचेच असल्यामुळे, वरवर दिसणारे दोष, शरीराचीं व्यंगें शरीराचे कांहीं नैसर्गिक व्यापार, स्त्रीपुरुषांचे कांहीं व्यवहार, यांकडे दृष्टि वळवून, कांहीतरी करून, अन्नदात्याचे मन रिझविण्याचा त्याने प्रयत्न केल्यास नवल नाहीं. गोंधळ्यांचा विनोद एकदा ऐकला, कीं, पुनः ऐकावयास जाण्याची इच्छा होत नाहीं, याचे कारण हेंच आहे. खुषमस्करे व गोंधळी यांची गोष्ट<noinclude></noinclude>
tfeudjesa5e8scco0p2i0s747gsiy4k
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१०४
104
112023
236448
2026-09-01T06:01:00Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ९२ ) बाजूला ठेवून, रोजच्या अनुभवाच्या गोष्टी घेतल्यास अर्से दिसेल कीं, विनोदी ह्मणविणारे लोक दुसऱ्यांचा मूर्खपणा व पर्यायाने स्वतःची प्रौढी दाखविण्यांतच तत्पर असतात. द..."
236448
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
( ९२ )
बाजूला ठेवून, रोजच्या अनुभवाच्या गोष्टी घेतल्यास अर्से दिसेल कीं, विनोदी ह्मणविणारे लोक दुसऱ्यांचा मूर्खपणा व पर्यायाने स्वतःची प्रौढी दाखविण्यांतच तत्पर असतात. दुसऱ्यांचीं व्यंगें व त्यांचे दोष उघड करून त्यांना हिणवर्णे इतरांपुढे त्यांना ओशाळे करणे, लोकांनां टोचून बोलणे, वेडावणें, नक्कल करणे, मंडळींत जाण्याचा सराव नसल्यामुळे भांबावणारांनां टीका करून अधिक गोंध- ळविणे, शिष्टाचाराचा अतिक्रम करून सवाल जबाब करणें, ह्मणजे विनोद नव्हे. इतरांच्या मूर्खपणाचें प्रदर्शन देखील नव्हे. तें स्वतःच्या अक्कलशून्यतेचें, रान- टीपणाचें मात्र प्रदर्शन खरें । आह्मां हिंदी लोकांतल्या अंमलदारी विनोदाची ओळख नाहीं, असे लोक फार थोडे सांपडतील ! विनोद ह्मणजे टवाळकी, वि- नोद ह्मणजे बाष्कळपणा, अशी समजूत होण्याचें मुख्य कारण वर सांगितल्या- प्रमाणे समाजांत घडणारे प्रकार, हें असावें.
विनोदाचें शुद्ध रूप पहावयाचे असल्यास, सुधारलेल्या समाजाकडे वळलें पाहिजे. कारण, विनोदाचा पोष होण्यास जे विशिष्ट संस्कार आवश्यक असतात, ते अर्धवट समाजांत आढळत नाहीत. सुधारलेल्या समाजांत देखील, शुद्ध विनोद जेथें तेथें दिसतो, अशी मात्र कोणाची समजूत असल्यास ती चुकीची आहे. सर्वमान्य विनोदी ग्रंथ व सर्वमान्य विनोदी लेखक फार थोडे असतात. सहज व शुद्ध विनोद आणि ओहूनताणून आणलेला विनोद, यांमधला भेद पहावयाचा असल्यास Taratarin de Tarascon हा फ्रेंच भाषेतला ग्रंथ ( इंग्रजीत याचे भाषांतर झाले आहे.) व Handy Andy हा इंग्रजीतला ग्रंथ यांची तुलना करून पहावी; किंवा 'Pickwick Papers' व 'Han- dy Andy' यांची तुलना करावी; किंवा ' Pickwick Papers ' व त्याचें मराठी वेषांतर 'सशोधनसमाजसमाचार' यांची करून पहावी; किंवा Le Bourgeois Gentil home व त्याचें वेषांतर रावबहादूर पर्वत्या' यांची करून पहावी !
विनोदी वाङ्मय.
विनोदी वाङ्मयाचा अभ्यास करतांना पहिला उद्देश, उत्तम कृतींशी परिचय करून घेऊन स्वतःच्या रुचीला वळण लावावयाचे, हाच असला पाहिजे. कोण- त्याहि प्रकारचें वाङ्मय घेतलें, तरी प्रथम पारख करण्याची शक्ति वाचकानें
,<noinclude></noinclude>
4y3vfx6o0seozl07myngcwwxsj17s68
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/१०५
104
112024
236449
2026-09-01T06:01:29Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ९३ ) अंगी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे उघड आहे. आता ज्याप्रमाणें नाना- प्रकारचें उत्तम काव्य इंग्रजी भाषेत अधिक आढळतें त्याप्रमाणें नानाप्रकारचीं विनोदाचीं रूपें फ..."
236449
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
( ९३ )
अंगी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे उघड आहे. आता ज्याप्रमाणें नाना- प्रकारचें उत्तम काव्य इंग्रजी भाषेत अधिक आढळतें त्याप्रमाणें नानाप्रकारचीं विनोदाचीं रूपें फ्रेंच भाषेत अधिक आढळतात. फ्रेंच वाङ्मयाचा एक मोठा विशेष विनोद हा आहे, असें झटल्यास अतिशयोक्ति होणार नाहीं. असें जरी असले तरी तुलनात्मक पद्धतीच्या स्पष्टीकरणार्थ हा लेख असल्यामुळे, निवळ फ्रेंच वाङ्मयावरच न विसंबतां इतर वाङ्मयांचा शक्य तितका निर्देश करणें अवश्य आहे. शिवाय, वाङ्मयाच्या उद्देशाकडे लक्ष देऊन विनोदी वाङ्मय असा एक भाग केला असल्यामुळे शक्य तितक्या निरनिराळ्या वाङ्मयांचा निर्देश होणें विशेष बोधक आहे. कारण विनोद दुःसाध्य असल्यामुळे, सर्वमान्य ग्रंथ फार थोडे झाले आहेत, व ते सुदैवाने तीनचार तरी भाषांत वांटले गेले आहेत. भाषेची नड कदाचित् पुढे आली असती; पण फक्त इंग्लिशमध्ये देखील सर्वोची भाषांतरें उपलब्ध आहेत. फ्रेंच किंवा जर्मन, किंवा दोन्ही येत असल्यास सर्व विनोदी वाङ्मय रसिकांना मोकळे आहे.
विसंगतपणा दाखविण्याचे प्रकार.
सर्वमान्य विनोदी ग्रंथांची ओळख करून देण्याच्या आधी, विसंगतपणा दाखविण्याचे जे प्रकार आहेत, त्याकडे थोडेसे लक्ष देऊ.
शरीर व आत्मा या विजोडांच्या संयोगामुळे, दृश्य व अदृश्य अशा काहीशा भिन्न असणाऱ्या सृष्टींचा नरदेहांत मिलाफ झाल्यामुळे, विसंगतपणाचें मूळ मनुष्यस्वभावांत सर्वत्र पसरतें, असें वर दाखविलेंच आहे. आतां मनुष्य- स्वभाव जसा बहुरूपी त्याप्रमाणेच विसंगतपणाहि असणार, हे उघड आहे. विसंगतपणाचे प्रकार अगणित असल्यामुळे ते वाङ्मयति व्यक्त करण्याचे प्रकारद्दि अगणित आहेत. शिवाय, मनुष्यस्वभाव कालमानाप्रमाणे बदलत असल्यामुळें, तो सारखा उमलत असल्यामुळे, नवीं नवीं रूपें प्रत्ययास येत असल्यामुळे, विनोदालाहि विविधता येत आहे. असें जरी असले, तरी विसंगतपणा दाखवून विनोदाचा पोष करण्याच्या अनंत प्रकारति, एक मुख्य उद्देश ओळखतां येतो. वस्तुतः असणारा विसंगतपणा नाहीं असें कल्पून, त्याला सुसंगताचें रूप द्यावयाचें, खरी स्थिति एकदम न सांगत, मोठा आव आणून असंबद्ध कारणे लावून नंतर तीं सुचावावयाचीं, व असें करून विसंगतपणाची जाणीव तीव्र करावयाची, हा उद्देश होय. उदाहर- णार्थ, रशिया व जपान या राष्ट्रांमध्ये लढाई सुरू असतांना लंडनमधील<noinclude></noinclude>
e2mq12yh5e6i77dhqrsxm1xv9a2t55l