विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.20 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:आमची संस्कृती.pdf/98 104 21477 237081 237080 2026-09-17T06:25:47Z कल्पनाशक्ती 3813 237081 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / ९१}}
</noinclude>हिंदू समाजात परस्परांहून विभक्त अशा तीन हजारांहून अधिक जाती व त्याहीपेक्षा अधिक पोटजाती आहेत. हा प्रकार म्हणजे अलीकडे उत्पन्न झालेले अत्यंत भयंकर द्वैत असे जगाला दिसते. पण हे जे द्वैत दिसते त्याचा अर्थ एका समाजाचे अनेक तुकडे पडले असा नाही, तर दृढीकरणाचे कार्य अपूर्ण राहिले असा आहे.' (पृष्ठ ३८२) एक मोठे बलिष्ठ राष्ट्र निर्माण करण्याचा उपदेश करणारे व्यापक विचार आणि भावना हिंदुस्थानात उदय न पावल्याने येथे पाहिजे ते ऐक्य घडून आले नाही. जातीची कल्पना व नंतर एकदम मानव्याची कल्पना अशा दोनच ऐक्याच्या कल्पना प्राचीन हिंदू लोकांस अवगत होत्या. हिंदूंनी जरी सर्वव्यापी असे समाजव्यवस्थाशास्त्र निर्माण केले तरी सर्व जग आपले म्हणून स्वीकारील असे ह्या व्यवस्थेचे स्वरूप नव्हते व नाही. हिंदुस्थानचे राजेरजवाडे ब्राह्मणांची मदत घेऊन जग जिंकू शकले नसते तर, किंवा ब्राह्मण इतर सर्व लोकांचे पुरोहित झाले असते तर, त्यांच्या सामाजिक विचारांना सर्वत्र मान्यता मिळाली असती.' (ही वाक्ये जशीच्या तशी Hinduism: its Formation and Future' ह्या ग्रंथात पाहावयास सापडतात.)
{{gap}}ह्या वाक्यांमध्ये केतकरांचे हिंदू समाजशास्त्राबद्दलचे विचार पूर्णत्वाने दिसून येतात. 'हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात (पृ.२३५ ते ४४२) चातुर्वर्ण्य संस्था व ती टिकविण्यास काय प्रयत्न करावे ह्याबद्दल बऱ्याच विस्ताराने विचार केला आहे. त्यात मुख्य कल्पना खालीलप्रमाणे आहे- 'चातुर्वर्ण्यसंरक्षण हा आपला प्रथमधर्म आहे.' 'समाजात चार वर्ण आहेत, अधिक नाहीत. प्रत्येक वर्णाचे पृथकत्व गुणविभिन्नतामूलक आहे. निरनिराळे वर्ण व समाज ह्यांचा संबंध अवयव व अवयवी असा आहे. अध्ययनादी क्रिया, संरक्षणादी क्रिया, द्रव्योत्पादक व्यवहार व लोकांची सेवा या क्रिया ज्या समाजात नाहीत असा समाज असणे अशक्य आहे; व चातुर्वर्ण्याचे अस्तित्व स्वाभाविक आहे. मग ह्या गोष्टीचे संरक्षण ते काय करावयाचे?' ह्या प्रशाला केतकर उत्तर देतात की, 'आपले वर्णभिन्नत्व केवळ क्रियाभिन्नत्वमूलकच नाही- आपले चातुर्वर्ण्य संस्कारांकित आहे.' आणि चातुर्वर्ण्य टिकवायचे असेल तर (१) संस्कार वर्णानुरूप असून गुणकर्मावरच अवलंबून पाहिजे. (२) वर्णनिर्णयार्थ इतिहासापेक्षा सद्यःकालीन प्रत्ययास अधिक महत्त्व पाहिजे.' ही क्रिया करताना एखाद्या व्यक्तीस कर्मानुसार उच्च किंवा नीच वर्णात घालावयाचे असल्यास त्याने आपल्या कुलाचा व बांधवांचा संबंध सोडावा की<noinclude></noinclude> 00e0y4isljpg0tuy1pmlno86su8bayl 237083 237081 2026-09-17T06:28:08Z कल्पनाशक्ती 3813 237083 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / ९१}}
</noinclude>हिंदू समाजात परस्परांहून विभक्त अशा तीन हजारांहून अधिक जाती व त्याहीपेक्षा अधिक पोटजाती आहेत. हा प्रकार म्हणजे अलीकडे उत्पन्न झालेले अत्यंत भयंकर द्वैत असे जगाला दिसते. पण हे जे द्वैत दिसते त्याचा अर्थ एका समाजाचे अनेक तुकडे पडले असा नाही, तर दृढीकरणाचे कार्य अपूर्ण राहिले असा आहे.' (पृष्ठ ३८२) एक मोठे बलिष्ठ राष्ट्र निर्माण करण्याचा उपदेश करणारे व्यापक विचार आणि भावना हिंदुस्थानात उदय न पावल्याने येथे पाहिजे ते ऐक्य घडून आले नाही. जातीची कल्पना व नंतर एकदम मानव्याची कल्पना अशा दोनच ऐक्याच्या कल्पना प्राचीन हिंदू लोकांस अवगत होत्या. हिंदूंनी जरी सर्वव्यापी असे समाजव्यवस्थाशास्त्र निर्माण केले तरी सर्व जग आपले म्हणून स्वीकारील असे ह्या व्यवस्थेचे स्वरूप नव्हते व नाही. हिंदुस्थानचे राजेरजवाडे ब्राह्मणांची मदत घेऊन जग जिंकू शकले नसते तर, किंवा ब्राह्मण इतर सर्व लोकांचे पुरोहित झाले असते तर, त्यांच्या सामाजिक विचारांना सर्वत्र मान्यता मिळाली असती.' (ही वाक्ये जशीच्या तशी Hinduism: its Formation and Future' ह्या ग्रंथात पाहावयास सापडतात.)
{{gap}}ह्या वाक्यांमध्ये केतकरांचे हिंदू समाजशास्त्राबद्दलचे विचार पूर्णत्वाने दिसून येतात. 'हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात (पृ.२३५ ते ४४२) चातुर्वर्ण्य संस्था व ती टिकविण्यास काय प्रयत्न करावे ह्याबद्दल बऱ्याच विस्ताराने विचार केला आहे. त्यात मुख्य कल्पना खालीलप्रमाणे आहे- 'चातुर्वर्ण्यसंरक्षण हा आपला प्रथमधर्म आहे.' 'समाजात चार वर्ण आहेत, अधिक नाहीत. प्रत्येक वर्णाचे पृथकत्व गुणविभिन्नतामूलक आहे. निरनिराळे वर्ण व समाज ह्यांचा संबंध अवयव व अवयवी असा आहे. अध्ययनादी क्रिया, संरक्षणादी क्रिया, द्रव्योत्पादक व्यवहार व लोकांची सेवा या क्रिया ज्या समाजात नाहीत असा समाज असणे अशक्य आहे; व चातुर्वर्ण्याचे अस्तित्व स्वाभाविक आहे. मग ह्या गोष्टीचे संरक्षण ते काय करावयाचे?' ह्या प्रशाला केतकर उत्तर देतात की, 'आपले वर्णभिन्नत्व केवळ क्रियाभिन्नत्वमूलकच नाही- आपले चातुर्वर्ण्य संस्कारांकित आहे.' आणि चातुर्वर्ण्य टिकवायचे असेल तर (१) संस्कार वर्णानुरूप असून गुणकर्मावरच अवलंबून पाहिजे. (२) वर्णनिर्णयार्थ इतिहासापेक्षा सद्यःकालीन प्रत्ययास अधिक महत्त्व पाहिजे.' ही क्रिया करताना एखाद्या व्यक्तीस कर्मानुसार उच्च किंवा नीच वर्णात घालावयाचे असल्यास त्याने आपल्या कुलाचा व बांधवांचा संबंध सोडावा की{{nop}}<noinclude></noinclude> 5fr4y83qoaevu8we0zanuljs0501b9w पान:आमची संस्कृती.pdf/99 104 21478 237082 138618 2026-09-17T06:27:01Z कल्पनाशक्ती 3813 /* मजकुराविना */ duplicate page 237082 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude> 6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm पान:आमची संस्कृती.pdf/100 104 21479 237084 138629 2026-09-17T06:31:38Z कल्पनाशक्ती 3813 237084 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / ९३}}</noinclude>{{blue|वाचकांसाठी सूचना- मधले एक पान या पुस्तकात गाळले गेले आहे.}} {{gap}}ब्राह्मणांच्या विद्येविषयी किंवा संस्कृतिरक्षणाच्या कामगिरीविषयी कोणाचे दुमत होणार नाही. पण त्यांचे समाजघटनाशास्त्र व समाजधारणाशास्त्र दोषरहित खासच नव्हते. ब्राह्मणांनी तयार केलेली घटना व शासनसंस्था आपल्या वर्गापुरतीच होती. इतर वर्गानी ब्राह्मणांच्या व्यवहारांत- अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ केल्यास काय शासन असावे एवढ्यापुरता इतर वर्गाशी त्यांचा संबंध होता. क्षत्रिय हे शासनकर्ते असल्यामुळे काही काळ त्यांना मोठा दर्जा देऊन संभाळून घेण्याचे काम ब्राह्मणांनी केले; पण इतर सामान्य जनांसाठी त्यांनी काय केले? खालील जातींचा विवाहसुद्धा ते धार्मिक विधी म्हणून मानण्यास तयार नव्हते. त्यांनी शूद्र म्हटलेल्या लोकांत ज्या हजारो जाती होत्या त्यांतील व्यक्तींचे नियंत्रण त्या त्या जातींतील वृद्धांच्या पंचायतीकडून होई; त्या गोष्टी ब्राह्मणांपर्यंत येतच नसत. एवढेच नव्हे, तर ज्या जातिसंस्थेने हिंदू समाजधारणेचे मुख्य कार्य आजपर्यंत केले ती जातिसंस्थासुद्धा ब्राह्मणांनी उत्पन्न केली नाही, असे केतकरच सांगतात.
{{gap}}केतकरांच्या मते परमतसहिष्णुता व परधर्मातील दैवतांचे आत्मीकरण हे दोन हिंदु समाजाचे मोठे गुण आहेत. पण हीच वृत्ती बुद्ध, ख्रिस्त व महंमद ह्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वच सुसंस्कृत समाजांत दिसून येते. इजिप्त, असीरिया आणि नंतर ग्रीक व रोम या सर्वच ठिकाणी लोकांनी हिंदूंच्यासारखे तेहतीस कोटी देव जमविलेच होते; व परधर्मीय म्हणजे अमक्या एका दैवतावर विश्वास ठेवणारा म्हणून कोणाही मनुष्याचा छळ करण्याकडे ह्या जुन्या संस्कृतीची प्रवृत्ती नसे. छळ झाला तो फक्त ख्रिस्ती यहुदी लोकांचा आणि तो त्यांच्या स्वतःच्या आततायीपणामुळे व असहिष्णुतेमुळे. त्यांनी जर 'आमचा देव तेवढाच खरा' असा हटवादीपणा केला नसता, तर त्यांच्या संप्रदायाला कोणी विचारले देखील नसते. ख्रिस्तपूर्व संस्कृतीत सर्वच धर्म सामाजिक व प्रादेशिक स्वरूपाचे होते; आणि त्यांना इतर कोणी प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्यांचे विधिनिषेध सर्वच मानवांना उद्देशून होते. हे वैशिष्ट्य फक्त हिंदू धर्मापुरतेच होते असे नाही, ही गोष्ट डॉ. केतकरांनी लक्षात घेतलेली दिसत नाही.
{{gap}}ख्रिस्ती व महंमदी धर्माच्या आक्रमणामुळे हिंदू समाजाच्या दृढीकरणास वेळ मिळाला नाही, हेही केतकरांचे म्हणणे बरोबर नाही. चातुर्वर्ण्य व जातिसंस्था ह्यांच्या द्वारे निरनिराळ्या भारतीय समाजाचे एकीकरण झाले हे<noinclude></noinclude> ti8jga9mv4kb25y0rpen39qnz51zijw पान:आमची संस्कृती.pdf/101 104 21480 237085 138660 2026-09-17T06:37:54Z कल्पनाशक्ती 3813 237085 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />९४ / आमची संस्कृती
</noinclude>खरे, परंतु ह्याच कल्पनांत सध्या दिसून येणाऱ्या द्वैताचा उगम आहे हे विसरता कामा नये. बहुतेक नव्या जातींना शूद्र म्हणून समाजात नीच स्थान देणे, म्हणजे दृढीकरण करणे खासच नव्हे. हिंदूंच्या घटनापद्धतीने समाजाचे संपूर्ण दृढीकरण होणेच शक्य नव्हते. शूद्र म्हणून ब्राह्मणांनी दूर केलेल्या वर्णातून महंमद, ख्रिस्त व बुद्ध ह्यांना मुख्यत्वे अनुयायी मिळाले. अर्थात आपले सध्याचे राज्यकर्ते ब्रह्मद्वेष पसरवितात असेच न म्हणता ब्राह्मणद्वेष सामान्य जनतेत केव्हाही चटकन पसरविता येई हे म्हणणे इतिहासास धरून होईल. महंमदी व ख्रिस्ती धर्म मनुष्यप्रणीत, अतएव असहिष्णू व दुराग्रही संप्रदायस्वरूपाचे आहेत, आणि त्यांच्या आक्रमणाचा इतिहास जुन्या संस्कृतीचे संवर्धन करून नव्याची भर घालण्याच्या स्वरूपाचा नसून मुख्यतः विध्वंसनाचा आहे, हे प्राचीन भारताविषयीचे केतकरांचे विधान बव्हंशी खरे आहे; आणि सध्याच्या रानटी समजल्या जाणाऱ्या मनुष्यजातींचा इतिहास पाहिला तर ह्या म्हणण्याची सत्यता अधिक पटेल. हे सर्व जरी खरे, तरी खालच्या वर्णाच्या लोकांना आकर्षक भासणारे ह्या संप्रदायातील मानवांच्या समतेचे तत्त्व आहे, हे मान्य केले पाहिजे. भारतीयांच्या एका काळच्या उज्वल संस्कृतीकडे पाहून हिंदू धर्माचे सर्वव्यापी व प्रभावी स्वरूपात पुनरुज्जीवन होईल, अशी केतकरांची कल्पना होती.
{{gap}}मनुष्यप्रणीत संप्रदायांच्या द्वेषमूलक व स्पर्धाजनक मगरमिठीतून मनुष्यांची सुटका होऊन सर्व जग सहिष्णू व परस्परसाहाय्यक धर्मतत्त्वाच्या अंमलाखाली सुखाने नांदेल, हे गोड स्वप्न केतकरांप्रमाणेच जगातील इतर आशावादीही आपल्यापुढे रंगवीत आहेत. मात्र जगातील अन्याय विषमता केवळ धर्मभिन्नत्वामुळे उत्पन्न झालेली नसून ती बऱ्याच अंशी आर्थिक गोष्टींवरून आलेली आहे, हा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे; आणि आर्थिक विषमता नाहीशी झाली म्हणजे सर्वास लागू पडणाऱ्या साधारण मानवधर्माची निर्मिती होईल, अशी कित्येक समाजशास्त्रज्ञांना व समाजधुरीणांना आशा आहे. केतकरासारख्या आत्यंतिक आशावादी समाजशास्त्रज्ञाच्या कामगिरीचे सिंहावलोकन ह्या आशावादावरच संपविणे योग्य होणार नाही काय?
{{right|{{xxxx-larger|+}}}}{{nop}}<noinclude></noinclude> 04ko03jm2jgvj5nrzo3dp37wnm262rc पान:आमची संस्कृती.pdf/102 104 21481 237086 138632 2026-09-17T06:41:36Z कल्पनाशक्ती 3813 237086 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / ९५}}</noinclude>

{{gap}}'''८. कऱ्हाड अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण'''

{{gap}}अध्यक्षबाईसाहेब व बंधु-भगिनींनो,
{{gap}}तुम्ही उत्तर सातारकरांनी मला येथे बोलावून माझा जो सन्मान केला आहे त्याबद्दल मी तुमची फार ऋणी आहे. कोणत्याही समारंभाला जाऊन भाषण करण्याचे माझ्या अतिशय जीवावर येते, ह्याचे कारण म्हणजे मी माणूसघाणी आहे असे नव्हे. इतरांच्या मानाने मी कामात बुडालेली असते व मला क्षणाचीही फुरसत नसते असेही नव्हे. पण अशा तऱ्हेच्या व्यासपीठावरून बोलण्याचा माझा अधिकार नाही असे मला मनोमन वाटते व दुसरे कारण म्हणजे प्रत्येक कार्याला बाहेरचे माणूस बोलावण्याचा आजकालचा प्रघात मला पसंत नाही. एखादी शाळा म्हणा, संघ म्हणा, ह्याचे काय कार्य चालले आहे हे त्या त्या शाळांत किंवा प्रदेशात चांगले माहीत असते. बाहेरचा माणूस कार्याच्या कळकळीने यायला प्रवृत्त होतो असे नसून कोणत्या तरी व्यक्तीच्या आग्रहाला बळी पडून येतो. आमंत्रण स्वीकारले म्हणजे त्या संस्थेचा अहवाल चाळून त्याबद्दल चार शब्द आपल्या भाषणात सांगतो. ते चार शब्द अर्थातच मोठ्या गौरवाचे असणार; कारण पाहुणचाराचा पहिला शिष्टाचार तरी पाहुण्याला पाळला पाहिजे. आणि इतर भाषणात सर्वसाधारण उपदेश केलेला असतो. कार्यकर्त्यांपैकी कित्येकांचा वेळ पाहुण्यांच्या सरबराईत फुकट जातो हे<noinclude></noinclude> o21abxzcud3mbir0n7f26ztqpdvqtnp पान:आमची संस्कृती.pdf/103 104 21482 237087 138634 2026-09-17T06:44:39Z कल्पनाशक्ती 3813 237087 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />९६ / आमची संस्कृती
</noinclude>निराळेच. मीही ह्या अशाच पाहुण्यांपैकी, त्यांतून कोणत्याही तऱ्हेचे सामाजिक कार्य प्रत्यक्ष अंग मोडून न केलेली. तेव्हा माझे भाषण वरील तऱ्हेच्या पाहुण्यांसारखे किंबहुना त्याहूनही कमी दर्जाचे झाले तर नवल नाही व मी त्याबद्दल आपणा सर्वांची क्षमा मागून ठेवते.
{{gap}}प्रत्यक्ष समाजकार्य करणाऱ्या धुरीणांना मी काय सांगणार असा विचार करताना माझ्या मनात आले की, कार्य काय करावे हे अंगी पात्रता नसताना सांगण्याचा अतिक्रम न करता समाजधारणेला कुठच्या गोष्टीची आवश्यकता आहे हे सांगितले तर कार्यकर्त्यांना त्याचा कदाचित उपयोग होईल. रणक्षेत्रावर शिपाई लढत असतात, ते आपल्या कामांत कसूर करीत नाहीत; पण त्यांना कल्पना नसते. प्रत्यक्ष लढाईत न उतरता लांब बसून, नकाशा पुढे ठेवून, शत्रूच्या हालचाली, डोंगर, नद्या, नाले, प्रदेशाचा उंचसखलपणा, वगैरे सर्व ध्यानात धरून कुठून व कशी चढाई करावी, आपल्या फळीत कच्चेपणा कुठे आहे, संरक्षण हालचाली कशा कराव्या वगैरे गोष्टी पुष्कळदा लांब असणाऱ्या माणसाला सांगता येतात. तसाच काहीसा माझा आजचा प्रयत्न आहे.
{{gap}}समाजातील घटकांचे परस्परावलंबन, समाजिक समता म्हणजे काय व हल्लीच्या काळी आपली स्थिती सुधारण्यास आपणास काय करता येईल ह्याविषयी काही थोड्या गोष्टी मी आपणांशी बोलायचे योजले आहे.

{{gap}}'''समाजातील घटकांचे परस्परावलंबित्व'''
{{gap}}अगदी लहानपणी आपण पोट व इतर अवयव ह्याबद्दल गोष्ट वाचला असेल. त्यात सर्व अवयव न भांडता एकमेकांशी सहकार्याने राहिले तरच शरीरपोषण व शरीर-व्यापार शक्य आहेत, एरवी नाही व त्याचप्रमाण समाजाचे निरनिराळे घटक एकमेकांशी सहकार्याने राहिले पाहिजेत असा सारांश दिला आहे. ही रूपक-कथा व सारांश फार जुना आहे. ऐकला म्हणजे सर्व त्याला माना डोलावतात. पण त्याचा अर्थ नीट अंतःकरणाला जाऊन भिडत नाही. समाजाचे सर्व घटक सुदृढ, मजबूत असले तरच सहकार्य नीट होऊ शकते. एखादा घटक जरी दुर्बल असला तरी सर्व समाज दुबळा होतो हे आपल्या चटदिशी ध्यानात येत नाही. समाजात काही थोडे लोक सुशिक्षित व विद्वान असले तर त्यांच्या ज्ञानाच्या प्रभेने बहुसंख्य<noinclude></noinclude> 3k47wpdxyayldogmt9jtdum3ori3vp8 पान:आमची संस्कृती.pdf/104 104 21483 237088 138635 2026-09-17T06:53:53Z कल्पनाशक्ती 3813 237088 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / ९७}}</noinclude>निरक्षरांपुढे पडलेला अंधार दूर होत नाही, काही थोडे घरे बांधून, मोटारी ठेवून राहिले म्हणून ज्यांना घरदार नाही अशांची दैना कमी होत नाही. काही थोड्यांना भरपूर अन्न व कपडे मिळाले म्हणून अर्धपोटी उघड्या नागड्यांना ऊबही येत नाही व त्यांचे पोटही भरत नाही. जेव्हा बहुतेक सर्वांच्या प्राथमिक गरजा भागतील तेव्हा सर्व घटक मिळून एक बलशाली समाज निर्माण होईल, एरवी नाही. हे साध्य होण्यास एका घटकाची वेदना ती सर्व घटकांची, ही भावना असली पाहिजे. पायाच्या करंगळीला टोचले तर सर्व शरीराला वेदना झाल्या पाहिजेत. अगदी हीच प्राथमिक भावना आपणात नष्ट होत चालली आहे. जातिनिष्ठ समाजात एक एक जात, आपण एका विराट समाजाचा लहानसा अवयव आहो हे विसरून सबंध समाज जणू आपणातच सामावला आहे ह्या भावनेने वर्तन करीत असते. ब्रिटिशांच्या राजवटीत व सध्याच्या काळात जातिनिष्ठा पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. पूर्वी आपापल्या गावी सर्वांना सांभाळून वागावे लागे. जात किंवा गाव वाळीत टाकील तर जिणे अशक्यप्राय होत असे. ब्रिटिशांच्या राज्यात कुटुंबाला, जातीला व गावाला धाब्यावर बसविणे शक्य झाले. पूर्वी आपल्या गावांतील व भोवतालच्या पाच दहा गावांतीलच जातभाई माहीत असत. ब्रिटिशांच्या दळणवळणादी साधनांमुळे सातासमुद्राच्या पलीकडचे जातभाई ओळखीचे होऊ लागले व इतर जातीच्या शेजाऱ्यांपेक्षा जवळचे वाटू लागले. ब्रिटिशांआधी कोकणस्थ चितपावन संघ, अखिल भारतीय धनगर समाज, मराठा शिक्षण मंडळ अशासारख्या केवळ विशिष्ट जातीच्या कल्याणासाठी काढलेल्या संस्था कोणत्या तरी राजवटीत होत्या काय? संस्थेचा उद्देश कल्याणप्रद असला तरी तीमुळे जातीय भावना बळावते व समाजाचे कल्याण तेच जातीचे कल्याण ही भावना नष्ट होण्याच्या मार्गावर लागते. दोनशे वर्षांपूर्वीपासून मद्रास इलाख्यात वस्ती करून राहिलेले, घरची बोली तामीळ झालेले चितपावन युवक पुण्याच्या चितपावन संघाकडून मदत मिळवून मद्रासला शिक्षण करतात ही गोष्ट काय सांगते? तुमच्या सातारच्या धनगरांचे कल्याण सातारा जिल्ह्याच्या समृद्धीवर अवलंबून आहे, की पंजाबच्या जातभाईंच्या संघटनेवर अवलंबून आहे? एके काळी महाराष्ट्राचे राज्यकर्ते असलेले व उद्याच्या भविष्यकाळात राज्यसूत्रे<noinclude></noinclude> 6yzs96tnzx5fbwff70jqxctfxjwjjft सदस्य चर्चा:Vishal9631 3 112216 237089 2026-09-17T10:52:16Z स्वागत आणि साहाय्य चमू 815 नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला 237089 wikitext text/x-wiki {{Template:Welcome|realName=|name=Vishal9631}} -- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १६:२२, १७ सप्टेंबर २०२६ (IST) 41xjlqyb391dozzanx0y4j1fl8swkmc