विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.20
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:आमची संस्कृती.pdf/106
104
21485
237092
138638
2026-09-18T04:28:19Z
कल्पनाशक्ती
3813
237092
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / ९९}}</noinclude>निग्रो लोकांना निग्रोपणाची चीड येत नाही तर निग्रो म्हणून मिळणाच्या सामाजिक वागणुकीचा त्यांना संताप येतो. वरच्या जातींना ह्या चिडीची कल्पना यावयाची नाही. पण आपल्या सुदैवाने आपणावर अशी एक राष्ट्रीय आपत्ती कोसळली होती की, ह्या अन्यायाची थोडीशी चुणूक आपणा सर्वांना दिसली असेल. इंग्रजांच्या राजवटीत काही क्लबांवर, काही कंपन्यांच्या आवरात, हिंदी माणूस व कुत्रे यांना मज्जाव (Indians & dogs not allowed) अशा तऱ्हेच्या पाट्या असत. आपल्या भूमीवर आपल्याला अशी वागणूक मिळावी म्हणून सर्व देशभक्तांचा संतापाने भडका उडे, पण अगदी अशीच वागणूक आपण आपल्या देशबांधवांना देतो हे त्यांच्या ध्यानी येत नसे व अजूनही येत नाही. मनुष्यगणनेत जातींची नावे गेली. कायद्याने सर्व जातींना समानता दिली, पण खेड्यापाड्यांतून, मंदिरे, विहिरी, आखाडे, चावडी ह्या ठिकाणी सर्वांना प्रवेश मिळतो का? ह्या सर्व ठिकाणी कुत्री व गाढवे जाऊ शकतात. पण काही जातींतील माणसांची तेथे जाण्याची छाती नाही. ही झाली सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतींतील विषमता. अगदी अशीच विषमता संपत्तीच्या बाबतींतही दिसते. पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संशोधन संस्थेने गेल्या पंधरा वर्षांत महाराष्ट्रातील काही शहरे व बरीचशी खेडेगावे ह्यांची आर्थिक पाहणी केली. त्यात त्यांना दिसून आले की, सुस्थितीच्या बाबतीत श्रेष्ठ, कनिष्ठ अशी वर्गवारी केल्यास ब्राह्मण-मराठे-व महार असा क्रम लागतो. काही मराठा घराणी सधन असतील. काही महार काही मराठ्यांपेक्षा खाऊन पिऊन सुखी असतील. पण एकंदर सबंध जातीचा विचार केला तर, ब्राह्मण व तत्सम जाती मराठे व तत्सम जातींपेक्षा व मराठे आदि जाती अस्पृश्यांपेक्षा राहणीच्या मानात वरचढ आहेत. जेथे समाजाचे मोठाले घटक अशा विषम परिस्थितीत आहेत तेथे एकमेकांविषयी प्रेम व बंधुभाव नांदणे शक्य नाही.

{{gap}}सामाजिक समता व विषमता हे शब्द आपण वारंवार उपयोगितो. पण त्याचा अर्थ व व्याप्ती काय हे पुष्कळदा समजत नाही. सामाजिक समता म्हणजे समाजातील प्रत्येकाचे उत्पन्न सारखेच असले पाहिजे असे नव्हे. कारण जरी राष्ट्रीय संपत्तीची अशी वाटणी केली तरी थोड्याच अवकाशात व्यक्तींच्या स्वभावानुसार व कष्टांनुसार त्यांत फरक होईल. ज्या समाजात<noinclude></noinclude>
10keh2rtxm29yiy9038xildlseruo37
पान:आमची संस्कृती.pdf/107
104
21486
237093
138640
2026-09-18T04:32:35Z
कल्पनाशक्ती
3813
237093
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१०० / आमची संस्कृती
</noinclude>सर्वात श्रीमंत व सर्वांत गरीब ह्यांच्या संपत्तीचे प्रमाण १०:१, ८:१, ५:१, ४:१ असे राहील, जेथे संपत्तीचा संचय होणार नाही अशा तऱ्हेचे कर असतात व जेथे सर्वात श्रीमंतीचा दर्जा गाठण्याची संधी सगळ्यांना मिळते त्या समाजात आर्थिक विषमता नाही असे म्हणण्यास हरकत नाही. काही उदाहरणे दिली म्हणजे माझे म्हणणे स्पष्ट कळेल. पहिल्या महायुद्धापूर्वी ग्रेट ब्रिटनमध्ये आर्थिकदृष्ट्या करोडोपतीपासून अगदी गरिबांपर्यंत साधारणपणे पाच वर्ग होते. दुसऱ्या महायुद्धानंतर सर्वात वरचा व सर्वांत खालचा वर्ग हे दोन जवळजवळ नष्ट झाले होते, व सांपत्तिकदृष्ट्या तीनच वर्ग राहिले होते. मृत्यूनंतर वारसाला मिळावयाच्या संपत्तीवर बसवलेला जबरदस्त कर व मजूर चळवळीमुळे मजुरांच्या पगारात झालेली वाढ ह्यामुळे ही गोष्ट घडून आली व समाजातील सांपत्तिक विषमता बऱ्याच अंशी कमी झाली; म्हातारपणाचे सार्वत्रिक पेन्शन, सरकारी औषधोपचार, तेरा वर्षांपर्यंत फुकट शिक्षण, गरिबांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या व बेकारांना मदत वगैरे गोष्टींमुळे उरलेली विषमताही हळूहळू कमी होत आहे. आज कोळशाच्या खाणीत काम करणाऱ्या मजुराचा पगार लंडन युनिव्हर्सिटीच्या लेक्चररइतका जवळवळ आहे. अमेरिकेत सर्वात मोठ्या प्राध्यापकाला वर्षाचे ९ ते १० हजार डॉलर पगार असला तर त्याच कॉलेजातील शिपायाला २ हजार डॉलर पगार असतो. पगाराचे हेच मान जपानमध्येही दिसून येते. पगारदार लोकांत सर्वांत जास्त व सर्वांत कमी पगारात ५:१ पेक्षा जास्त तफावत असू नये. धंद्यातील लोक जास्त पैसा कमावतात. कारखानदार व गरिबांच्या कमाईचे प्रमाण १०:१ किंवा त्यापेक्षाही व्यस्त असते. पण ह्या कमाईवर जबर कर असतात व वारसाकडे जातांना मोठा लचका तुटतो. ह्यामुळे बरेच श्रीमंत लोक जिवंतपणीच रुग्णालये, शाळा-कॉलेजे वगैरेंना मुक्त हस्ताने मदत करतात. ह्याशिवाय ह्या सर्व देशांतून औषधोपचार बऱ्याच अंशात फुकट असतो व शिक्षण- दुय्यम शिक्षण नुसते प्रायमरी नव्हे- फुकट किंवा अतिशय स्वस्त असते. आर्थिक विषमता जाणवते ती आपल्या माणसाच्या आजारात पैसा नसला म्हणजे, म्हातारपणी हातपाय थकले म्हणजे, मुलांना शाळेत घालायला पैसे नसले म्हणजे. आपण लहान घरात राहतो, शेजाऱ्याचा बंगला आहे याबद्दल वैषम्य वाटत नाही, पण वरील गोष्टींनी, माणूस म्हणून जगता<noinclude></noinclude>
dof0e80ui3yiiszmqfcyzaf3e78pyf1
पान:आमची संस्कृती.pdf/108
104
21487
237094
138641
2026-09-18T05:12:04Z
कल्पनाशक्ती
3813
237094
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १०१}}</noinclude>येण्यासारखीसुद्धा स्थिती नसली म्हणजे वाईट वाटते व विषमतेविरुद्ध संताप येतो. वरील समाजांतून गरिबाला शिक्षण वगैरे मिळून वर येण्यास संधी मिळते म्हणजे आजचा गरीब उद्याचा श्रीमंत होतो व दर पिढीस नव्याने परिश्रम न केल्यास कालचा श्रीमंत आज कंगाल होतो. अशा तऱ्हेची समाजव्यवस्था होणे आपल्या समाजात अत्यावश्यक आहे. त्याशिवाय समाजात एकोपा, प्रयत्नशीलता व शांती नांदणार नाही. अशी व्यवस्था राजकीय सत्तेने केली पाहिजे, एकट्या, दुकट्या समाजसेवकाचे हे काम नव्हे. ती करताना परस्परद्वेषाचा फैलाव होऊ न देण्याची काळजी घेतली पाहिजे. पण आपली सध्याची स्थिती विषमतेच्या इतक्या पराकोटीला गेली आहे की, वर सांगितलेल्या प्रकारांनी सामाजिक समता स्थापण्याचे प्रयत्न निकडीने झाले पाहिजेत. तसे झाले नाही तर सामाजिक व राजकीय क्रांती ह्यांच्या आगीत किती जीवांचा बळी पडेल ते सांगवत नाही. माझा पिंड स्त्रीचा आहे. सृजन, संगोपन व संवर्धन ही भाषा मला कळते व पटते. पण क्रांतीच्या नावाखाली चाललेला बेफाट प्रचार आणि संहारक मार्गाचा उपदेश मला पटत नाही, संहारातून जीवनाची मूल्ये निष्पन्न होतील असे वाटत नाही. सामाजिक पुनर्रचना समतेच्या पायावर तातडीने न झाल्यास मात्र तेच आपल्या नशिबी आहे हे निश्चित.

{{gap}}'''समाज व व्यक्ती'''

{{gap}}समाजाच्या घटकांचे परस्परावलंबन कसे असते हे पाहून आता व्यक्ती व समाज ह्यांचे परस्परसंबंध कसे असावे हे थोडक्यात सांगते. आपल्या समाजात ज्याप्रमाणे निरनिराळे घटक एकमेकांविषयी बेफिकीर आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तीही आपल्याला अगदी साधीसुधी तरी सामाजिक कर्तव्ये आहेत हे विसरून गेली आहे. स्वतः अगदी स्वच्छ राहिले, आपले घर झाडून लोटून साफ ठेवले व मग घरातील सर्व घाण रस्त्याच्या कोपऱ्यात टाकली किंवा म्युनिसिपालिटीच्या डब्यात नीट न टाकता लांब उभे राहून, एक हात नाकाला लावून भिरकावून दिली. तर त्या स्वच्छतेचे काहीही फळ मिळणार नाही. ह्या घाणीत वावरणाऱ्या माशा, डांस सर्व रोग घेऊन तुमच्या घरात पायाच्या धुळीबरोबर किंवा वाऱ्याबरोबर येणारच. तेव्हा फक्त एकाने श्रीमंत असून जशी समाजधारणा<noinclude></noinclude>
lq5zyj22qujum63mj29ay3178wsjtzj
सदस्य चर्चा:SHB
3
66457
237090
126490
2026-09-18T02:40:21Z
Max
5156
Max ने लेख [[सदस्य चर्चा:SHB2000]] वरुन [[सदस्य चर्चा:SHB]] ला हलविला: Automatically moved page while renaming the user "[[Special:CentralAuth/SHB2000|SHB2000]]" to "[[Special:CentralAuth/SHB|SHB]]"
126490
wikitext
text/x-wiki

Hello! Please message me on [[m:User talk:SHB2000|meta.wikimedia.org]] instead. I may not notice messages on this page.

ojy2vkqs676esjrcfi79dwyt0tjr5xc
सदस्य चर्चा:SHB2000
3
112217
237091
2026-09-18T02:40:21Z
Max
5156
Max ने लेख [[सदस्य चर्चा:SHB2000]] वरुन [[सदस्य चर्चा:SHB]] ला हलविला: Automatically moved page while renaming the user "[[Special:CentralAuth/SHB2000|SHB2000]]" to "[[Special:CentralAuth/SHB|SHB]]"
237091
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सदस्य चर्चा:SHB]]
1x7942dv3p9fp2gwcivi53omkjiz91g
सदस्य चर्चा:DKK45
3
112218
237095
2026-09-18T10:44:00Z
स्वागत आणि साहाय्य चमू
815
नवीन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
237095
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=DKK45}}
-- [[सदस्य:स्वागत आणि साहाय्य चमू|स्वागत आणि साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:स्वागत आणि साहाय्य चमू|चर्चा]]) १६:१४, १८ सप्टेंबर २०२६ (IST)
6b2uqnh5vfvqbawehsyni9nxec1fu8g