विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.20
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:आमची संस्कृती.pdf/109
104
21488
237097
138642
2026-09-18T15:54:38Z
कल्पनाशक्ती
3813
237097
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१०२ / आमची संस्कृती
</noinclude>होत नाही, तसे एकाने स्वच्छ राहून आरोग्य वाढत नाही. सर्वांनी मिळून स्वच्छता पाळली पाहिजे. सर्वांची मालमत्ता ही कोणाचीच नव्हे अशी वृत्ती ठेवून चालणार नाही. रस्त्यावर लावलेली झाडे सर्वांच्या मालकीची, त्यांना पाणी घातले नाही तर निदान खच्ची तरी करू नये; शाळा, चावडी, वसतिगृहे सर्वांची; ती झाडली नाहीत तर निदान थुंकून, रेघोट्या ओढून, मोडतोड करून त्यांची नासधूस करू नये. चालण्याचा रस्ता सर्वांचा, निदान आपल्याबरोबर इतरही त्या रस्त्याने जात येत आहेत, त्यांची पण सोय पाहावी एवढ्या साध्यासुध्या गोष्टीसुद्धा आज आपणाला कळेनाशा झाल्या आहेत. एका व्यक्तीच्या क्षुद्र क्षणिक गरजेसाठी पुढील पिढ्यांची आपण किती कुचंबणा करतो हे रस्त्यावरील छायेची झाडे चोरून तोडणाऱ्याला, शाळा कॉलेजातील पुस्तकांतील पाने फाडून नेणाऱ्यांना, जेथे कळत नाही तेथे स्त्रियांची बेअदबी होईल असे वर्तन करू नये, थोडक्या भांडणासाठी तट पाडून सबंध गाव बिघडवू नये हे कसे कळणार?

{{gap}}जेथे जेथे सरकारने असे करावे असे आपण म्हणतो तेव्हा, माझ्या हातून अमके झाले पाहिजे हे विसरतो. सरकारने आटोकाट प्रयत्न केले तरी प्रत्येक व्यक्तीने निष्ठेने त्यास हातभार लावला पाहिजे. समता व सुसंस्कृत जीवन निर्माण होण्यासाठी संपत्तीची निर्मिती, योग्य वाटप व सर्वांनी मिळून जतन आवश्यक आहे. तसेच कितीही संपत्ती निर्माण केली तरी प्रजा जर अविरतपणे वाढतच राहिली तर अपुरीच पडणार. सार्वजनिक स्वच्छता व औषधोपचार ह्यांनी मृत्यूला बंध घातला आहे. पाटबंधारे, सडका, रेल्वे वगैरेंनी उत्पादन व ने-आण सुलभ झाल्याने दुष्काळ नावाच्या मृत्यूला शह दिला आहे. अशा वेळी जननालाही बंध पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने व कुटुंबाने आपल्याला किती मुले झेपतात व कितीच भरण-पोषण नीट तऱ्हेने होईल हा विचार करूनच कुटुंबाचा विस्तार केला पाहिजे व अशा तऱ्हेने नव्या समाजाच्या रचनेला मदत केली पाहिजे.

{{gap}}- १९५४{{nop}}<noinclude></noinclude>
6ewa8vsde4u5yk4caneh2tifdbjbu5t
पान:आमची संस्कृती.pdf/112
104
21491
237098
138644
2026-09-18T15:57:09Z
कल्पनाशक्ती
3813
237098
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १०५}}</noinclude>जो रक्ताचा संबंध, तेवढाच निकटचा संबंध जीवशास्त्राच्या दृष्टीने बहिणीची मुले व बहिणभावांची मुले ह्यांमध्ये असतो. काही जमाती ह्या दोन्ही अपत्यांतील विवाह त्याज्य ठरवितात, तर काही जमातीत भावांच्या मुलांची (चुलत भावंडांची) लग्ने होत नाहीत पण बहिणीच्या मुलांचे भावाच्या मुलाशी (आते-मामे भावंडांचे) लग्न योग्य समजले जाते. तेव्हा अशा कोणत्याही तऱ्हेच्या लग्नाला तडकाफडकी बेकायदा ठरवायचे असेल तर 'आम्हांला ते अयोग्य वाटते' ही सबब पुरणार नाही. अशा तऱ्हेच्या लग्नाचे सामाजिक व शारीरिक परिणाम काय होतात हे ठरवून मगच ते योग्य की अयोग्य हे ठरविता येईल. मामा-भाचीच्या लग्नाच्या प्रश्नाचा अभ्यास झाला पाहिजे. अशा लग्नांमध्ये वर बराच प्रौढ व वधू अगदी कोवळ्या वयाची, असला प्रकार बराच आढळून येतो काय? अशा लग्नांपासून संतती कमी निपजते काय? किंवा निपजलेली संतती अल्पायुषी किंवा रोगट असते काय? अशा लग्नांमुळे कुटुंबात भांडणे वगैरे फार होतात काय? ज्या जमातींत अशी लग्ने होतात तेथे ही लग्ने करणे भाग असते का दुसऱ्या कोणाशी लग्न केले तर चालते? अशी लग्ने होण्यास कोणती परिस्थिती कारणीभूत आहे, वगैरे प्रश्नांचा नीट, खोल व पूर्वग्रहविरहित अभ्यास झाला पाहिजे व मगच त्यावर पसंतीचे किंवा नापसंतीचे शिक्कामोर्तब करणे योग्य होईल. केवळ एक विशिष्ट रूढी आपल्याला अपरिचित, आपण पूज्य मानलेल्या धर्मग्रंथात न सांगितलेली, अतएव त्याज्य, असे तडकाफडकी ठरविणे हे कोत्या मनाचे व सामाजिक असहिष्णुतेचे लक्षण आहे.

{{gap}}त्याचप्रमाणे हिंदूंच्या लग्नाबद्दल समितीची वृत्ती काही मुद्यांवर द्विधा आहे. कोणाही दोन हिंदूंत झालेले लग्न (१) त्यांपैकी कोणी वेडे नसेल तर, (२) पहिल्या लग्नाचा पति किंवा पत्नी हयात नसेल तर व (३) सापिण्ड्य नसेल तर कायदेशीर असावे, असे म्हटल्यावर वरील कलमांना विकल्प म्हणून खालील जादा कलमे दिली आहेत. १. दोन्ही विवाहेच्छू एका वर्णाचे (ब्राह्मण, वैश्य, शूद्र वगैरे) असावे व २. एका जातीचे असल्यास एका गोत्रप्रवराचे नसावे. ह्यापैकी पहिले वैयल्पिक कलम नवीन सुरू झालेल्या आंतरजातीय विवाहाविरुद्ध व वर्षसहस्रके चालत आलेल्या हिंदू धर्मावरील कलंकाची तरफदारी करणारे व<noinclude></noinclude>
04bvixa7jesbh93pmtjtfuivzmmpjla
पान:आमची संस्कृती.pdf/113
104
21492
237099
138655
2026-09-18T15:59:52Z
कल्पनाशक्ती
3813
237099
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१०६ / आमची संस्कृती
</noinclude>अन्यायाचे असल्यामुळेच सर्वथैव त्याज्य आहे. दुसरे कलम कायदेकारांनी स्वत:च घातलेल्या सापिण्ड्याच्या व्याख्येला अतिव्याप्तिदोषामुळे बाधक आहे. ही दोन्ही कलमे केवळ परंपरागत रूढीला भिऊन घातली आहेत, असे दिसते. ज्यांचे गोत्र एक असते अशा एका पोटजातीतील कुटुंबांचा रक्ताचा संबंध वीस पिढ्यांतसुद्धा नाही असे पुष्कळ वेळा दिसून येते. कधी असलाच तर तो हजार वर्षांपूर्वी असला तर कोण जाणे. अशी स्थिती असता व सगोत्रीयांचा विवाह दिवसेंदिवस जास्त प्रमाणात होत असता ह्या मरू घातलेल्या रूढीला कारणाविना जिवंत करून योग्य वधू-वरांच्या लग्नात एक निष्कारण अडथळा नवीन कायद्याने निर्माण केला आहे. जेथे सगोत्रीयांचा रक्तसंबंध नसतो असे सिद्ध करता येते तेथे प्रवरांची तर गोष्टच बोलावयास नको. एक सापिण्ड्याचे बंधन पुरेसे आहे व तेही हिंदुस्थानच्या काही विभागात पाळीत नाहीत, हे आते-मामे भावंडांच्या विवाहाच्या रूढीबद्दल सांगताना वर दाखविलेच आहे.

{{gap}}बरे, ही जी वैकल्पिक कलमे दिली आहेत त्यांनाही लागलीच परत विकल्प सुचवून दोन हिंदूचे लग्न एरवी जर कायदेशीर असेल तर ते केवळ दोन वर्णाचे आहेत, किंवा एकाच वर्णाचे सगोत्रीय आहेत, ह्या मुद्यावर बेकायदेशीर होऊ नये अशी तरतूद केली आहे. म्हणजे समितीच्या मनात आहे तरी काय हेच समजत नाही?

{{gap}}हिंदुस्थानात प्रचलित असलेल्या निरनिराळ्या पद्धती, उदाहरणार्थ विज्ञानेश्वराची, दायभागाची, वगैरेंचा विचार करून त्यांतील पुढारलेल्या व प्रगतिशील विभागांचे एकत्रीकरण करून सर्व हिंदूंना लागू पडेल असा एकच कायदा करण्याची समितीची प्रतिज्ञा काही बाबतींत सफळ होण शक्य नाही, काही बाबतीत एकच कायदा सर्वांना लावण्याच्या अट्टाहासान पुष्कळ जमातींवर अन्याय होण्याचा संभव आहे, व सर्वांना आवडेल असा कायदा करण्याच्या भरात तो प्रगमनशील होत नाही हे वरती सोदाहरण दाखविलेच आहे. आता ह्या कायद्यांत सुचविलेल्या कलमांची क्रमाने चर्चा करू.

{{gap}}हिंदूच्या लग्नाबद्दल जी कलमे आहे त्यांतील काहींचे विवेचन पूर्वी केलेच आहे.
आता राहि हे होय. यालेले एक कलम म्हणजे विवाहेच्छु वधुवराना पहिल्या विवाहाचा पति किंवा पत्नी असता कामा नये हे होय. ह्या<noinclude></noinclude>
92opwmbybnbe7mmocvooky1zewqfgzx
पान:आमची संस्कृती.pdf/114
104
21493
237100
138679
2026-09-18T16:01:35Z
कल्पनाशक्ती
3813
237100
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १०७}}
</noinclude>कलमाप्रमाणे सर्व हिंदू पुरुष कायद्याच्या सक्तीने एकपत्निक होतील. अशा तऱ्हेचा कायदा ख्रिस्ती धर्मीयांत सार्वत्रिक आहे. हा नवा कायदा न्याय्य होईल काय, त्यामुळे समाजाचे हित होईल काय किंवा कौटुंबिक जीवनातील सौख्य वाढेल काय हे पाहिले पाहिजे. तसेच फक्त ह्या कलमाचाच नुसता विचार न होता त्याच्याबरोबरच एकदा झालेले लग्न कोणत्या परिस्थितीत मोडता येईल हे पाहणे, म्हणजे काडीमोडीच्या कलमांचा विचार होणेही जरूर आहे.

{{gap}}हल्ली जगात मोठाल्या समाजात बहुपत्नित्वाची मुभा असूनही एकापेक्षा अधिक बायका करणारे लोक अगदी थोडेच आढळतात. त्यांतूनही दुसरे लग्न करणाच्या पुरुषाला पहिल्या पत्नीला नीट पोटगी देणे भाग पडले तर ही संख्या आणखीही घटेल, व अशा तऱ्हेची व्यवस्था हिंदुस्थानातील मुसलमान समाजात आढळून येते. लग्नाच्या वेळेला बायकोला (विभक्त झाल्यास) म्हणून द्यावयाच्या रकमेचा आकडा पडतो, तो अवास्तव मोठा घालतात. मुसलमानांच्या कायद्याप्रमाणे घटस्फोट अतिशयच सोपा आहे. पण घटस्फोट झाल्यास लग्नाच्या कराराप्रमाणे पहिल्या स्त्रीस द्यावयाची पोटगी जर योग्य प्रमाणात असेल तर सहसा दुसरे लग्न पुरुष करणार नाही. पण असे काही प्रसंग असतात की पहिली स्त्रीच पतीला द्वितीय विवाहास उद्युक्त करते. अशा वेळी समाजाने त्यात कायद्याची आडकाठी ठेवू नये. एका माणसाला एकापेक्षा अधिक बायका असणे ही गोष्ट बालहत्या, मनुष्यवध वगैर गुन्ह्यासारखी अनीतिकारक खासच नव्हे, की ज्यासाठी कायद्याने त्याचा निषेध करावा. ह्या रूढीमुळे जे सामाजिक अपाय होतात त्याचे परिमार्जन झाल्यावर एकपत्नित्वाचा कायदा करणे योग्य होणार नाही. स्त्रीला कायद्याने स्वतःचे व मुलांचे पोषण करण्याची व्यवस्था मागता येईल, पण प्रेम ही वस्तू काही कायद्याने देण्या-घेण्याची नव्हे. अगदी रजिस्टर पद्धतीने लग्न करूनही स्त्री त्या बाबतीत सुखी होईल ही कल्पनाच भ्रममूलक आहे. एकदा नवऱ्याचे मन उडाले म्हणजे केवळ कायद्याने त्याला आपल्याशी बांधून घेऊन निष्प्रेम संसार करण्यात कोणा स्त्रीला धन्यता वाटेल? अशा सक्तीच्या एकत्र राहण्यात मुलांचा तरी फायदा काय? अशा वेळी घटस्फोट किंवा विभक्तीकरण असे दोन मार्ग स्त्रीला शक्य होत आहेत. ह्यांपैकी कोणत्याही<noinclude></noinclude>
m1h1e6qd36oea2r05lo74xlv73atlmw
237101
237100
2026-09-18T16:01:51Z
कल्पनाशक्ती
3813
237101
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १०७}}</noinclude>कलमाप्रमाणे सर्व हिंदू पुरुष कायद्याच्या सक्तीने एकपत्निक होतील. अशा तऱ्हेचा कायदा ख्रिस्ती धर्मीयांत सार्वत्रिक आहे. हा नवा कायदा न्याय्य होईल काय, त्यामुळे समाजाचे हित होईल काय किंवा कौटुंबिक जीवनातील सौख्य वाढेल काय हे पाहिले पाहिजे. तसेच फक्त ह्या कलमाचाच नुसता विचार न होता त्याच्याबरोबरच एकदा झालेले लग्न कोणत्या परिस्थितीत मोडता येईल हे पाहणे, म्हणजे काडीमोडीच्या कलमांचा विचार होणेही जरूर आहे.

{{gap}}हल्ली जगात मोठाल्या समाजात बहुपत्नित्वाची मुभा असूनही एकापेक्षा अधिक बायका करणारे लोक अगदी थोडेच आढळतात. त्यांतूनही दुसरे लग्न करणाच्या पुरुषाला पहिल्या पत्नीला नीट पोटगी देणे भाग पडले तर ही संख्या आणखीही घटेल, व अशा तऱ्हेची व्यवस्था हिंदुस्थानातील मुसलमान समाजात आढळून येते. लग्नाच्या वेळेला बायकोला (विभक्त झाल्यास) म्हणून द्यावयाच्या रकमेचा आकडा पडतो, तो अवास्तव मोठा घालतात. मुसलमानांच्या कायद्याप्रमाणे घटस्फोट अतिशयच सोपा आहे. पण घटस्फोट झाल्यास लग्नाच्या कराराप्रमाणे पहिल्या स्त्रीस द्यावयाची पोटगी जर योग्य प्रमाणात असेल तर सहसा दुसरे लग्न पुरुष करणार नाही. पण असे काही प्रसंग असतात की पहिली स्त्रीच पतीला द्वितीय विवाहास उद्युक्त करते. अशा वेळी समाजाने त्यात कायद्याची आडकाठी ठेवू नये. एका माणसाला एकापेक्षा अधिक बायका असणे ही गोष्ट बालहत्या, मनुष्यवध वगैर गुन्ह्यासारखी अनीतिकारक खासच नव्हे, की ज्यासाठी कायद्याने त्याचा निषेध करावा. ह्या रूढीमुळे जे सामाजिक अपाय होतात त्याचे परिमार्जन झाल्यावर एकपत्नित्वाचा कायदा करणे योग्य होणार नाही. स्त्रीला कायद्याने स्वतःचे व मुलांचे पोषण करण्याची व्यवस्था मागता येईल, पण प्रेम ही वस्तू काही कायद्याने देण्या-घेण्याची नव्हे. अगदी रजिस्टर पद्धतीने लग्न करूनही स्त्री त्या बाबतीत सुखी होईल ही कल्पनाच भ्रममूलक आहे. एकदा नवऱ्याचे मन उडाले म्हणजे केवळ कायद्याने त्याला आपल्याशी बांधून घेऊन निष्प्रेम संसार करण्यात कोणा स्त्रीला धन्यता वाटेल? अशा सक्तीच्या एकत्र राहण्यात मुलांचा तरी फायदा काय? अशा वेळी घटस्फोट किंवा विभक्तीकरण असे दोन मार्ग स्त्रीला शक्य होत आहेत. ह्यांपैकी कोणत्याही<noinclude></noinclude>
qll9n23tqfd50lt31dfdefgpqozc44c
पान:आमची संस्कृती.pdf/115
104
21494
237102
138681
2026-09-18T16:04:21Z
कल्पनाशक्ती
3813
237102
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१०८ / आमची संस्कृती
</noinclude>मार्गाचा परिस्थितीप्रमाणे तिला अवलंब करता यावा. तो मार्ग फक्त घटस्फोटाचाच असावा असा हट्ट का? सवतीच्या सान्निध्याने स्त्रिया किती दुःखी होतात हा विचार मी करीत नाही असा आरोप माझ्यावर केला आहे, असे मला वाटते. नव्या हिंदु कायद्यात जर घटस्फोटाची वगैरे व्यवस्था केली तर स्त्रीला १. नवऱ्यापासून विभक्त होणे २. नवऱ्यापासून काडीमोड मिळणे किंवा ३. सवतीबरोबर नव्या कुटुंबात राहणे असे तीन मार्ग राहतात व त्यांपैकी कोणत्याही एकाचा स्वीकार तिला करता येईल. तिला सक्तीने हल्ली राहावे लागते तसे सवतीबरोबर राहावे लागणार नाही. अशी परिस्थिती झाली म्हणजे एकपत्नित्वाची सक्ती बव्हंशी निरर्थक व काही थोड्या प्रसंगी अन्याय्य होईल. थोडी उदाहरणे खाली देत आहे. ह्यांपैकी कोणतेही उदाहरण काल्पनिक नाही.

{{gap}}हल्ली हिंदुस्थानात धर्म बदलणे कपडे बदलण्यापेक्षाही सोपे झाले आहे. एका ख्रिश्चन बाईने तिच्या प्रियकराची पहिली पत्नी जिवंत होती म्हणून धर्मत्याग करून हिंदू होऊन त्या माणसाशी लग्न केले. हिंदू कायदा बदलला तरी बहुपत्नित्व असलेल्या पुष्कळ जमाती हिंदुस्थानात राहतीलच व तितकीच वेळ आली तर घटस्फोट मिळत नाही म्हणून धर्मांतर करून लोकांना आपली दुसऱ्या लग्नाची हौस भागवता येईल व असे झाल्यास प्रथम पत्नीच्या पोटगीवर व वारसा हक्कावरही गदा येण्याचा संभव आहे.

{{gap}}एका बाईस मूल होणे शक्य नाही म्हणून तिने आपल्या नवऱ्याला दुसरे लग्न करावयास लावले. आता ती सवतीच्या मुलांचा मोठ्या प्रेमान सांभाळ करीत आहे. कायद्याचे एकपत्नीत्व असते तर त्या बाईला घटस्फोट तरी घ्यावा लागता किंवा दत्तक तरी घ्यावा लागता. ह्यापक काहीच न करता हा तिसरा मार्ग स्त्रीला मोकळा असावा असे माझे मत आहे. दुसऱ्याचे मूल घेऊन पोसत बसण्यापेक्षा स्वतःचे, नाही तर निदान नवऱ्याचे, स्वतःच्या घरी ज्याचा जन्म झाला आहे असे मूल जवळ काही स्त्रियांना दत्तक घेण्यापेक्षा पसंत पडेल व कायद्याने त्यांना तस करण्यास आडकाठी करू नये.

{{gap}}एका लग्नात असे आढळून आले की, एका बाईशी स्त्री म्हणून संबंध ठेवणे शक्य नाही. नवऱ्याने दुसरी बायको केली व दोन्ही सवती एक घरी नांदत आहेत. घटस्फोट मागून बाईचे शारीरिक वैगुण्य चव्हाट्यावर<noinclude></noinclude>
om8d858vubfnhpw97b0d7okno3m14bm
पान:आमची संस्कृती.pdf/116
104
21495
237103
138686
2026-09-18T16:05:42Z
कल्पनाशक्ती
3813
237103
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १०९}}</noinclude>आणण्यापेक्षा झाला हा प्रकार योग्य झाला असेच म्हणावे लागेल.

{{gap}}सध्याच्या महायुद्धात युरोपातील इतके तरुण मारले गेले आहेत की, अठरा ते तीसच्या जवान पुरुषांची राष्ट्राला कित्येक वर्षे वाण भासेल. त्या वयाच्या स्त्रिया मात्र होत्या तेवढ्याच आहेत. अशीच अवस्था गेल्या युद्धानंतरही झाली होती. ह्या सर्व प्रदेशात सक्तीचे एकपत्नित्व असल्यामुळे लाखो स्त्रियांना वैवाहिक जीवन मिळणे अशक्य झाले. कुवार राहणे किंवा पुरुषाशी लग्नबाह्य संबंध ठेवणे एवढेच त्यांना शक्य होते. देशात ज्यांची संसाराची इच्छा अतृप्त राहिली आहे व त्यामुळे ज्यांना मानसिक विकृती झाल्या आहेत अशा स्त्रियांची संख्या वाढली व दुसरीकडून विवाहसंस्थेचेच उच्चाटण होण्याची वेळ आली. कारण बऱ्याच मिळवत्या बायकांनी विवाहबाह्य संबंध करून मुले होणे हा स्त्रीचा जन्मसिद्ध हक्क आहे व कुमारी मातांना व त्यांच्या मुलांना राष्ट्रात मानाचे स्थान असावे अशी चळवळ सुरू केली, व तशा तऱ्हेचे कायदे करण्याच्या चळवळीही सुरू झाल्या. ह्या युद्धापूर्वी बर्लिन शहरात दरवर्षी होणारी औरस संतती अनौरस संततीपेक्षा कमी होती. (रशियात एखाद्या बाईला मूल झाले तर ते ज्या पुरुषापासून झाले असेल त्याच्याकडून त्या मुलाप्रीत्यर्थ पोटगी मिळते) म्हणजे कागदावर एकपत्नित्वाचा कायदा असूनही आचारात तो नाहीसा होण्याची वेळ आली आहे.

{{gap}}सुमारे दोन हजार वर्षे एकपत्नित्वाचा कायदा ख्रिस्ती लोकांत अस्तित्वात आहे. ह्या कायद्यामुळे तेथील स्त्रिया इतर देशांतील स्त्रियांपेक्षा जास्त सुखात व सुस्थितीत आहेत, तेथील कौटुंबिक जीवन जास्त सुखी व उच्च दर्जाचे आहे, असे म्हणण्यास काही आधार दिसत नाही. दरवर्षी संख्येने वाढत जाणारे घटस्फोट व विभक्तीकरण व मृतवत झालेल्या विवाहसंस्थेच्या व कुटुंबसंस्थेच्या पुनरुज्जीवनार्थ काय उपाययोजना करावी यावर समाजशास्त्रज्ञांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संभार पहिला म्हणजे वरील विधानाची सत्यता पटेल. अर्थात सध्याच्या अनवस्थेचे खापर एकपत्नित्वाच्या रूढीवरच फोडण्याची माझी इच्छा नाही. पण ह्या रूढीमुळे विवाहसंस्थेचे व कुटुंबसंस्थेचे पावित्र्य वाढेल ही कल्पना सर्वथैव भ्रममूलक आहे.

{{gap}}एकपत्नित्वाच्या कायद्यामुळे जर कोणाचे अतिशय नुकसान होणार<noinclude></noinclude>
6sxxvspl8s3c7c8zg5fxy77blkhfzb5
पान:आमची संस्कृती.pdf/117
104
21496
237104
138687
2026-09-18T16:10:43Z
कल्पनाशक्ती
3813
237104
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />११० / आमची संस्कृती
</noinclude>असेल तर ते नांबुद्री स्त्रियांचे. नंबुद्री लोकांचा वारसा कायदा व लग्नाची रूढी फार चमत्कारिक आहे. ह्यांच्यात फक्त मोठा मुलगा सर्व इस्टेटीचा वारस होतो व तेवढ्यालाच फक्त लग्न करण्याचा अधिकार असतो. ह्या रूढीमुळेच सर्व धाकटे मुलगे अविवाहित राहतात व ते त्याच प्रांतातील नायर बायकांशी संबंधम नावाच्या प्रकाराने संबंध ठेवतात. ह्या संबंधाची संतती नायर स्त्रीची होते. (नायर लोकांत मातृप्रधान कुटुंबपद्धती आहे) व त्यांच्या पोषणाची जबाबदारी नांबुद्री कुटुंबावर पडत नाही. आता स्वतंत्र नोकरी करणाऱ्या नांबुद्रीनी असा संबंधम केला तर त्याला कायदेशीर विवाह समजण्यात येऊन ती संतती कायदेशीररीत्या त्या नांबुद्रीची व्हावी असा कायदा आला आहे, पण त्या संततीला एकत्र कुटुंबाच्या इस्टेटीत भाग नाही. ह्या रूढीमुळे जो थोरला मुलगा लग्न करतो त्याला स्वतःच्या बहिणींची लग्ने करून द्यावयाची असल्यास बऱ्याच बायका कराव्या लागतात. कारण दरवेळी माझ्या बहिणीशी तू लग्न केलेस तर मी तुझ्या बहिणीशी लग्न करीन, अशा अटीवरच दुसऱ्या एका नंबुद्री कुटुंबांतील वडील मुलाशी बहिणीचे लग्न करावे लागते. काही नांबुद्री (थोरले मुलगे) बहुपत्निक असतात. बऱ्याच धाकट्या मुलांना अविवाहित राहावे लागत व बहुसंख्य नांबुद्री मुलींना जन्मभर कुंवार राहावे लागते; कारण त्यांना संबंधमसारखे विवाहबाह्य बंधन ठेवण्याची रूढीने सक्त मनाई आहे. वर सांगितल्याप्रमाणे हल्ली नांबुद्ऱ्यांचे धाकटे मुलगे शिकून डॉक्टरी वकिलीसारखे स्वतंत्र धंदे करू लागले आहेत व आपल्याच जातीतील ब्राह्मण मुलींशी लग्ने करण्याची इच्छा असूनही नांबुद्री मुलींचे बाप अशा मुलाशी आपल्या मुलीचे लग्न लावीत नाहीत, तर त्यांना कुवार ठेवण पत्करतात! ह्या समाजातील लग्नाच्या वयाच्या, संततीचे उत्पादन करण्यास समर्थ अशा, बऱ्याच मुलींना कुवार राहावे लागत असल्यामुळे समाजाची लोकसंख्या हळूहळू घटत चालली आहे. त्यांतच जर सक्तीचे एकपत्नित्व पुरुषांवर लादले तर सबंध समाज नष्ट होईल. नव्या दुरुस्त कायद्यात वारस कोण असावे ह्याबद्दल जो कायदा केला आहे तो नाबुद्ऱ्यांना लागू नाही, असे स्पष्ट नमूद केले आहे. तेव्हा सबंध नांबुद्री समाजाची पाहणी करून त्यातील पुढारलेल्या समाजसुधारकांची आकांक्षा काय आहे हे न पाहता वारसाहक्कांत व त्यांशी संलग्न अशा विवाहपद्धतीत काही बदल<noinclude></noinclude>
ebi018wayt8ngqkh89r2uz6znknqfh5
पान:आमची संस्कृती.pdf/118
104
21497
237105
138688
2026-09-18T16:15:36Z
कल्पनाशक्ती
3813
237105
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १११ }}</noinclude>घडवून आणण्याचा प्रयत्न न करता फक्त एकपत्नित्वाचे कलम त्यांना लागू करणे म्हणजे त्या समाजाचा नाश करणे होय.

{{gap}}एकदा लग्न झाले म्हणजे जे नवे कुटुंब स्थापन होते, त्यांतील नवराबायकोनी एकोप्याने, गुणागोविंदाने आमरणान्त राहणे, ही स्थिती उत्तम. असल्या कुटुंबातील मुख्य माणसांच्या संतोषाची, सौख्याची व प्रेमाची सावली कुटुंबातील सर्व माणसांवर व विशेषतः कुटुंबात वाढणाऱ्या मुलांवर पडते, व आयुष्यातील महत्त्वाच्या संस्कारक्षम वयात त्यांच्या मानसिक विकासाला योग्य वातावरण मिळते. अशी कुटुंबे ज्या समाजात अधिक तो समाज कार्यक्षम व प्रगतीपर आहे, असे समजावयास हरकत नाही. सर्वच कुटुंबांतून अशी परिस्थिती असली तर उत्तमच. पण मृत्यू, रोग, दारिद्र्य व परस्परांचे निरनिराळ्या कारणांनी अननुरूपत्व ह्यांमुळे पुष्कळ कुटुंबात नवराबायकोचे पटत नाही. अशा वेळी घरात असंतोष, मारहाण, कुरकूर कायम ठेवून नवराबायकोने एकत्र राहिलेच पाहिजे, असा आग्रह धरणे समाजविघातक व अन्याय्य ठरेल, व म्हणून कोणत्याही कारणामुळे, जर नवराबायकोचे पटणे शक्य नसेल, तर लग्नविच्छेदनाची परवानगी असावी. ह्या विच्छेदनाच्या परवानगीसाठी सध्या अस्तित्वात असलेली कोर्ट व न्यायदानपद्धती मुळीच उपयोगी नाहीत. सध्याच्या कोर्टात असले खटले जाणे म्हणजे दोन्ही पक्षांनी रागाच्या भरात एकमेकांवर भलतेसलते खरेखोटे आरोप करणे, त्यातच वकिलांनी आपापल्या अशिलांची बाजू मांडण्याच्या भरात कौटुंबिक भांडणात भर घालणे व ह्या सर्व प्रकाराचे वर्तमानपत्रातून जाड टाईपात येणारे खुसखुशीत वर्णन, ह्यांमुळे ही भांडणे मिटण्याऐवजी वाढण्यासच मदत होईल. नव्या हिंदु कोडामध्ये घटस्फोटासाठी जी कारणे घातली आहेत, ती इतकी विकृत आहेत की, नवराबायकोने परस्परांची अब्रू चव्हाट्यावर आणल्याखेरीज त्यांना कधीही घटस्फोट मिळणे शक्य नाही. नवऱ्याला किंवा बायकोला असाध्य व सांसर्गिक (!) रोग सतत सात वर्षे झाला असेल व तो लग्नाच्या सहचाऱ्यापासून झाला नसेल तर घटस्फोट मिळण्याची व्यवस्था केली आहे! नवन्याचा किंवा बायकोचा सांसर्गिक रोग सात वर्षे सहन करणे व नंतर काडीमोड मिळणे ही सवलत काही अजब आहे! ही अशी निरनिराळी कारणपरंपरा<noinclude></noinclude>
g6f3ytxpx0cnjfja6trfqu71xkmzbte
पान:आमची संस्कृती.pdf/119
104
21498
237106
138689
2026-09-18T16:20:52Z
कल्पनाशक्ती
3813
237106
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />११२ / आमची संस्कृती
</noinclude>देत बसण्यापेक्षा घटस्फोटाचा कायदा अगदी निराळ्या स्वरूपाचा हवा.

{{gap}}घटस्फोट, पोटगी, विभक्तीकरण व मुलांचा ताबा हे सर्व प्रश्न एकमेकांशी संलग्न आहेत व ते एकसमयावच्छेदेकरून सोडविले पाहिजेत. नवराबायकोंना एकत्र राहण्यास नको असेल तर त्यांचे भांडण सध्याच्या कोर्टात न जाता त्यासाठी जुवेनाईल कोर्टाच्या धर्तीवर निराळी कोर्ट स्थापन होणे जरूर आहे. ह्या कोर्टात पगारी मॅजिस्ट्रेटच्या मदतीला अनुभवी स्त्री-पुरुषांचे सल्लागार मंडळ द्यावयास हवे. ह्या कोटात वकिलांना व वर्तमानपत्रांच्या बातमीदारांना जाण्यास बंदी असावी. कोर्टाचे काम शक्य तो गुप्त चालावे. फक्त घटस्फोट दिल्यास किंवा पोटगी दिल्यास कोर्टाचा जो कायम निकाल असेल तेवढाच प्रसिद्ध व्हावा. सर्व कौटुंबिक भांडणे ह्या कोर्टापुढे यावीत व कोर्टातील न्यायाधीश व पंच ह्यांनी भांडण ऐकून ते मिटविण्याची खटपट करूनही नवराबायकोचे पटण शक्य नाही असे त्यांना दिसले, तर त्यांनी अशा जोडप्याला घटस्फोटाचा किंवा विभक्त राहण्याची परवानगी द्यावी, अशी परवानगी देताना बायकोला पोटगी मिळावी काय? वगैरेही बाबींचा निकाल लागून बायकोला पोटगी मिळण्याची आज्ञा झाल्यास ती नियमाने व बिनबोभाट मिळण्याची व्यवस्था ह्या कोर्टामार्फत व्हावी. उदाहरणार्थ, एखादे जोडपे सर्वस्वी निरोगी व धडधाकट असूनही नवराबायकोच्या स्वभावदोषाने एकमेकांचे काडीमात्र पटत नसेल व घरात भांडणे, धुसपूस, मारहाण नित्य चालत असतील, तर अशा परिस्थितीत कोर्टाकडून दोघांचे पटवू द्यावयाचे प्रयत्न निष्फळ झाल्यास काडीमोड करण्यास किंवा निदान विभक्त राहण्याची परवानगी देण्यास प्रत्यवाय नसावा व अशा वेळी, मुले कोणाच्या ताब्यात दिल्यास मुलांचे संगोपन नीट होईल ते ठरवून त्याप्रमाणे करण्यास कोर्टास अधिकार असावा. किंवा नवरा किंवा बायको ह्यांपैकी कोणालाही व्यसनाधीनपणामुळे एखादा रोग होऊन नवराबायकोत वितुष्ट आले तर कोर्ट भांडण ऐकून, चार उपदेशाच्या गोष्टी सांगून किंवा देखरेख करून, औषधोपचाराची व्यवस्था करून व बायकोचे पटवून देण्याचे प्रयत्न करील आणि अशा प्रयत्नांना यश आले तर घटस्फोटाची कदाचित याचे जरूरी पडणार नाही. म्हणून अमक्याच कारणासाठी घटस्फोट मिळावा व अमक्यासाठी मिळू नये असे न ठरवता काही वर्षे निदान प्रयोग म्हणून तरी<noinclude></noinclude>
ro794rskxxzwf7424gohpj2r0c61qzf
पान:आमची संस्कृती.pdf/120
104
21499
237107
138690
2026-09-18T16:27:27Z
कल्पनाशक्ती
3813
237107
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / ११३}}</noinclude>नवराबायकोचे कोणत्याही कारणासाठी पटत नसल्यास घटस्फोट देण्याचा अधिकार अशा तऱ्हेच्या कोर्टाकडे सोपवावा. ह्यामुळे क्षुल्लक कारणासाठी होणारे घटस्फोट टळतील व जेथे कुटुंबस्वास्थ्य कायमचे बिघडेल अशी परिस्थिती निर्माण झाली असेल तेथेच नसती वाच्यता न होता घटस्फोट मिळू शकेल. नवरा दुसऱ्या धर्मात गेला, नवऱ्याने दुसरे लग्न करण्याचा घाट घातला, नवरा व्यसनी व बाहेरख्याली असला तर व इतर अनेक कारणांनी स्त्रीला नुसता घटस्फोटच नव्हे तर भरपूर पोटगी व मुलांचा ताबा मिळावा, अशा तऱ्हेची योजना ह्या कायद्याने करणे शक्य होईल. अशा तऱ्हेने नको असलेल्या लग्नातून स्वतःची मोकळीक करण्याची मुभा स्त्रियांना मिळाल्यावर सक्तीचे व सार्वत्रिक एकपत्नित्व सर्वस्वी अव्यवहार्य व अनावश्यक आहे. सध्या एकपतित्वं स्त्रीवर कायद्याने लादले आहे. नवऱ्याने सवत घरात आणली तर तिला लग्नातून सुटका करून घेऊन पोट भरण्याचा मार्ग नसल्यामुळे ती अगतिक असते व ह्यामुळे स्त्रीवर बहुपत्नित्वाच्या रूढीने अन्याय होतो. पण पोटगीसह घटस्फोटाचा वा विभक्तीकरणाचा कायदा अस्तित्वात आल्यावर बहुपत्निकाच्या कुटुंबात राहावे की नाही हा स्त्रीच्या मर्जीचा प्रश्न होई व तिला अशा कुटुंबातून बाहेर पडून आपली मुले घेऊन विभक्त राहता येईल. अशा तऱ्हेच्या व्यवस्थेने स्त्रीवरील सामाजिक अन्याय दूर होईल व जेथे बहुपत्निकांचे कुटुंब स्थापन होईल, तेथे ते सक्तीचे न होता जुन्या नव्या पत्नींच्या संमतीनेच स्थापन होईल. असे कुटुंब स्थापन होण्यास कायद्याचा प्रतिबंध नसावा. ज्या वेळी अशा कुटुंबातील परिस्थिती एकत्र राहण्यास योग्य असणार नाही, तेव्हा कोणत्याही पत्नीला केव्हाही विभक्त होता येईल, घटस्फोट मागता येईल व हवे असल्यास पुनर्लग्न करता येईल.

{{gap}}ह्या सर्व गोष्टी विचारात घेता व बहुपत्नित्वाच्या चालीत ज्यांना अन्याय व जुलूम होण्याचा संभव आहे अशांना कायद्याने संरक्षण दिल्यावर, कायद्याने हिंदू समाजावर एकपत्नित्व लादू नये असाच निष्कर्ष निघतो. शिवाय ज्यांना तसे हवे असेल त्यांना हिंदू राहूनही सिव्हिल मॅरेज अक्टप्रमाणे आपल्या नवऱ्यावर एकपत्नित्वाचे बंधन घालता येईलच तेव्हा ती सवलत असल्यावर तर जुनी रूढी बदलून टाकण्याचे मुळीच कारण नाही.{{nop}}<noinclude></noinclude>
fhrqodxijlg73npf856mcmoe1nqufp0
पान:आमची संस्कृती.pdf/121
104
21500
237108
138691
2026-09-18T16:29:14Z
कल्पनाशक्ती
3813
237108
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />११४ / आमची संस्कृती
</noinclude>{{gap}}एखादा हिंदू मनुष्य आपल्या इस्टेटीची व्यवस्था काय करावी हे लिहून न ठेवताच मेला तर त्याचे वारस कोण होतील याबद्दल कायदा करताना अगदी प्रथमच हिंदुस्थानातील काही विभागांना त्यातून वगळले आहे. चीफ कमिशनरच्या अंमलाखालील प्रांतांखेरीज इतर प्रांतांत शेतजमिनीबाबत हा कायदा लागू होणार नाही. साधारणपणे चीफ कमिशनरच्या अंमलाखालील मुलूख मागासलेले आहेत, त्यांना मात्र हा थोडाबहुत प्रगमनशील कायदा लागू होणार नाही व इतर मोठाल्या प्रांतांच्या बाबतीत मध्यवर्ती सरकार काहीही करू शकणार नाही. कोणत्याही प्रांताला स्वेच्छेने हा कायदा शेतजमिनीच्या इस्टेटीलाही लागू करता येईल हे खरे, पण तसे करण्याची सक्ती करण्याचे अधिकार मध्यवर्ती सरकारला नसल्याने शेतजमिनीबाबत हिंदुस्थानात प्रांताप्रांतांमधून निरनिराळे कायदे अस्तित्वात येतील व हल्ली नसलेले एक नवे वैचित्र्य प्रांताप्रांतांच्या रूढींत दिसून येईल.

{{gap}}तदनंतर इस्टेटीचे वारस कोण, ह्या विवेचनात विधवा बायको, मुलगा, मुलगी, बाप नसलेला नातू अगर पणतू असे पहिले वारस घातले आहेत. ह्या यादीपैकी कोणी नसल्यास मुलीचा मुलगा, आई, बाप, भाऊ व पुतण्या हे घातले आहेत, व ह्यांच्यापैकीही कोणी नसल्यास मुलाची व मुलीची मुलगी वगैरे घातली आहेत. मेलेल्या मुलाच्या मुलाला जर प्रथम श्रेणीतील वारस गणतात तर मेलेल्या मुलीच्या मुलाला मुलीलाही तोच हक्क असावा असे वाटते. त्याचप्रमाणे प्रथम श्रेणीतील वारस नसल्यास मुलाची मुलगी व मुलीचा मुलगा-मुलगी यांना इस्टेट मिळावी हे रास्त दिसते. मयताचे भाऊ-पुतणे ह्यांपेक्षा मयताला स्वतःच्या मुलांची मुलेच जास्त निकटवर्ती वाटणार हे उघड आहे व हा सर्व कायदा स्वकष्टार्जित इस्टेटीबद्दल असल्यामुळे तर अशा तऱ्हेने नातवंडांना (नातींना) वगळून इस्टेट दुसरीकडे जाण्यास मुभा देणे अन्यायाचे आहे. त्याचप्रमाणे निरनिराळ्या एकाखालच्या एक अशा वारसांच्या सहा श्रेणी दिल्या आहेत. त्यांमध्ये चुलते, चुलत चुलते, पुतणे, पुतण्यांचे मुलगे, चुलत पुतणे, मामाचा नातू, मामाचा मुलगा, मावशी, मावशीचा मुलगा, आत्याबाई, आजोबाची बहीण वगैरे लांबचे नातेवाईक दिले आहेत. पण कोठेही रक्षेच्या मुलाचे नाव नाही. हे न्याय्य नाही. एखादा मनुष्य जेव्हा रक्षा ठेवून<noinclude></noinclude>
g3kfiu6hkswmalo4r8ssxs6kph740wf
पान:आमची संस्कृती.pdf/122
104
21501
237109
138693
2026-09-18T16:31:43Z
कल्पनाशक्ती
3813
237109
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती /११५}}</noinclude>विवाहबाह्य पण कायम संबंध एखाद्या बाईशी जोडतो, त्यावेळी त्या बाईपासून होणाऱ्या संततीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर असते व त्याच्यामागे त्याच्या वारसांत कोठे तरी ह्या मुलांची तरतूद झाली पाहिजे. रक्षा म्हणजे एका पुरुषाचे घर धरून त्याच्याशी एकनिष्ठपणे राहिलेली स्त्री. ही स्त्री त्या पुरुषाच्या आयुष्यभर त्याच्याजवळ असते व तिची व तिच्या संततीची तरतूद कायद्याने होणे रास्त आहे. तसेच रक्षेला इस्टेटीत भाग दिला नाही तरी तिच्या व तिच्या अज्ञान मुलांच्या पोषणाइतकी व्यवस्था इस्टेटीतून होणे जरूर आहे. वेश्या ही धंदेवाईक व अनेक पुरुषांशी संबंध ठेवून त्याबद्दल मोबदला घेणारी बाई असते. तिचा संबंध मर्यादित स्वरूपाचा असतो व म्हणून तिच्याबद्दल कोणाही एका पुरुषावरच जबाबदारी पडत नाही. पण रक्षा एका पुरुषाची बांधलेली असते. त्या पुरुषाखेरीज तिला व तिच्या संततीला पोषणकर्ता दुसरा नसतो व म्हणून तिच्या व तिच्या संततीच्या पोषणाची जबाबदारी तिच्या मालकावर पडली पाहिजे. तसे न केल्यास रक्षा व रक्षेची पोरे ह्यांची जबाबदारी सबंध समाजावर पडेल व भोगणारा एक व निस्तरणारा दुसराच असा प्रकार होईल. ज्याप्रमाणे वारसांत मुलींना दुय्यम दर्जाचे स्थान दिले आहे, तसेच त्यापेक्षाही थोड्या कनिष्ठ दर्जाचे का होईना, पण दूरदूरच्या नातलगांपेक्षा जवळचे स्थान रक्षेच्या मुलांना देण्यास हवे.

{{gap}}ह्यानंतर दत्तक प्रकारासंबंधी एक दोन मुद्दे सांगावयाचे आहेत. त्यासंबंधी सौ. राणी लक्ष्मीबाई राजवाडे ह्यांनी दत्तक घेण्याची परवानगीच मुळी कायद्यातून काढून टाकावी असे आपल्या साक्षीत सांगितले असे ऐकीवात आहे. कोणत्याही साक्षीचा धड वृत्तांत कोणत्याच वर्तमानपत्रात आला नसल्यामुळे लक्ष्मीबाईचे नक्की म्हणणे काय आहे हे समजत नाही. पण वरीलप्रमाणे त्यांचे मत असल्यास माझी त्याला पूर्ण सहमती आहे. पण हिंदी कुटुंबात ही रूढी इतकी दृढमूल झाली आहे व पिण्डदान स्वपुत्रहस्ते व्हावे अशी हजारो हिंदूची इतकी तीव्र मनीषा आहे की, ती इतक्या तडकाफडकी काढू नये असे मला वाटते. शिक्षण व प्रचार ह्या दोन गोष्टींचा अवलंब करून सुशिक्षितांनी दत्तक न घेण्याची प्रथा पाडून ही रूढी हळूहळू नष्ट करावी; त्यासाठी कायद्याची मदत घेऊ नये.

{{gap}}ह्या दत्तक प्रकरणात कोणाही पुरुषाला, मग त्याचे लग्न झाले असो<noinclude></noinclude>
72e49m3t45u3p35dyvcrnlv1p54cmcm
पान:आमची संस्कृती.pdf/123
104
21502
237110
138694
2026-09-18T16:36:06Z
कल्पनाशक्ती
3813
237110
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />११६ / आमची संस्कृती
</noinclude>वा नसो, तो १५ वर्षे वयाचा असल्यास दत्तक घेण्याचा अधिकार दिला आहे पंधरा.वर्षे वयाच्या मुलग्याला लग्न करण्यास कायद्याने हल्ली मनाई आहे, इतकेच नव्हे तर पंधरा वर्षे वयाचा मुलगा संतती उत्पादन करण्यास तरी समर्थ असेल की नाही कोण जाणे. अशा वयात त्याला मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार असावा हे विचित्र नाही काय? जो मुलगा कायद्याने पती होऊ शकत नाही तो पिता होऊ शकतो. त्याला समितीच्या सभासदांकडून असे कारण देण्यात आले की, १५ वर्षे वयाचा मोठ्या इस्टेटीचा एकच एक वारस रोगाने लवकरच मरणार असे झाले तर त्याला दत्तक घेण्याचा प्रश्न उदभवतो व त्यासाठी ही वयोमर्यादा घातली आहे. तसे असेल तर मग कोणत्याच तऱ्हेची वयोमर्यादा घालण्याचे कारणच नाही. एखादा मोठ्या इस्टेटीचा आईबाप नसलेला एकमेव वारस पंधरा वर्षांचे आतही मृत्युमुखी पडण्याचा संभव आहेच. तेव्हा अशा वेळी कोणातरी नातेवाईकांस किंवा इष्टामित्रांस त्याचे वय काहीही असले तरी त्याच्याकडून दत्तविधान करवून घेता येईलच. धार्मिकदृष्ट्या दत्तक घेणारा मुंज झालेला असला पाहिजे असे असल्यास, फार तर ते बंधन घालता येईल, पण दुसरे बंधन असू नये किंवा असलेच तर निदान हल्लीच्या कायद्याप्रमाणे लग्नाच्या वयोमर्यादेशी विसंगत नाही अशी वयोमर्यादा तरी घालावी.

{{gap}}नव्या हिंदू कायद्यामुळे स्त्रियांना बापाच्या इस्टेटीचा काही भाग मिळण्याची व्यवस्था झाली आहे त्याचप्रमाणे बऱ्याच स्त्रिया स्वतंत्र राहून मिळवूही लागल्या आहेत. अशा कुवार स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार का नसावा ते समजत नाही. एखादी बाई विधवा असेल तर मात्र तिला दत्तक घेता येतो. पण ज्याप्रमाणे कुवार पुरुषाला दत्तक घेण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे कुमारी स्त्रीला तो अधिकार का दिला नाही हे समजत नाही.

{{gap}}त्याचप्रमाणे मुलगी दत्तक घेणे व देणे बेकायदेशीर मानले आहे. हे मत बहुसंख्य हिंदूंच्या रूढीला जुळेल असे आहे. ज्या हिंदूंमध्ये पण मुरुमकट्टायम किंवा आळियसंथानम पद्धतीने वारस जातो तेथे त्यांच्यात मुलगी दतक घेतल्याशिवाय चालणे शक्यच नाही. उदाहरणार्थ, त्रावणकोर संस्थानात राज्याचा वारस राजाचा मुलगा नसून राजाच्या बहिणीचा मुलगा असतो. राजाला बहीण नसेल तर राजाला किंवा राजमातेला मुलगा दत्तक<noinclude></noinclude>
6gg53vkse17vkkq9g0hxanutfofa38e
पान:आमची संस्कृती.pdf/124
104
21503
237111
138695
2026-09-18T16:39:42Z
कल्पनाशक्ती
3813
237111
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / ११७}}</noinclude>घेऊन भागणे शक्य नाही. कारण कायद्याप्रमाणे अशा मुलाला राज्य मिळणेच शक्य नाही व निर्देश होऊ नये म्हणून राजमातेला मुलगीच दत्तक घ्यावी लागेल व अशा मुलीचा मुलगा राज्याचा अधिकारी होईल. अशा तऱ्हेने त्रावणकोर राजघराण्यात पूर्वी मुलगी दत्तक घेतल्याचे नमूद आहे त्याचप्रमाणे परिस्थिती मुरुमकट्टायम व आळियसंथानम पद्धतीने ज्यांच्यात वारस जातो त्याच असणार. तसेच आसामात हिंदू खासी राजघराणी आहेत त्यांची रूढीही त्रावणकोरप्रमाणेच आहे त्यांच्यातही मुलगी दत्तक घेतल्याचे नमूद आहे. तेव्हा अशा सर्वांना मुलगी दत्तक घेण्याचा अधिकार ठेवलाच पाहिजे व तो कुमारी स्त्रीलाही क्वचित प्रसंगी बजावण्याचा हक्क ठेवावा लागेल हे उघडच आहे. अशा परिस्थितीत कोणाही पुरुषाने व स्त्रीने स्त्रीला व पुरुषाला दत्तक घेण्याचा अधिकार ठेवला तर तो कायदा सर्वव्यापी व सर्वांच्याच सोईचा होईल.

{{gap}}आपला हिंदू समाज हा एक जगातील प्राचीनतम समाजांपैकी आहे हिंदू या नावाखाली असंख्य वंश, असंख्य संस्कृती व असंख्य जमातींचे एकीकरण कमीत कमी चार हजार वर्षे अव्याहत चालू आहे. ह्या जमातींच्या रूढी निरनिराळ्या आहेत. काही पितृप्रधान कुटुंबपद्धती नाहीत तर काही अगदी जवळच्या सपिंडांत लग्ने करतात; काहींत सर्व मुलांना सारखा वाटा मिळतो, तर काहींत फक्त मोठा मुलगाच बापाच्या संपत्तीचा वारस असतो; काहींच्यात मुलांचा हुंडा घेतात तर काहींच्यात मुलींचा हुंडा घेतात; काहींच्यात विधवांना पुनर्लग्नाची परवानगी आहे काहींच्यात विधवा फक्त धाकट्या दिराशीच लग्न करू शकतात. तर काहींच्यात पुन्हा विवाह करताच येत नाही; काही समाज कृषिप्रधान काही वाणिज्य करणारे, काही पशुपालन करणारे तर काही केवळ वन्य स्थितीत आहेत. अशा सर्वांना सर्व बाबतीत एक कायदा करणे हे अवघड जवळजवळ अशक्यप्राय काम आहे. सध्याच्या रूढींतील अन्यायाचे परिमार्जन व्हावे व तेवढ्यापुरता कायद्याचा भाग सर्वांना लागू करावा हे योग्य आहे व इतर बाबतीत, उदाहरणार्थ आते-मामे भावंडांचे व मामा भाचीचे लग्न व नांबुद्री वारसा व विवाहपद्धत अशासारख्या रूढींचा अभ्यास करून त्यांतील समाजविघातक खरोखरीच कोणत्या आहेत हे<noinclude></noinclude>
irdan7ghk50v13wok5jlp05eypc882k
पान:आमची संस्कृती.pdf/125
104
21504
237112
138696
2026-09-18T16:40:53Z
कल्पनाशक्ती
3813
237112
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />११८ / आमची संस्कृती
</noinclude>ठरविणे रास्त आहे व मगच त्याबद्दल कायदा करणे योग्य ठरेल व शेवटी असेही निष्पन्न होणे शक्य आहे की, निरनिराळ्या रूढींपैकी कोणती हितकारक वा अहितकारक हे ठरविणे शक्य नाही, निरनिराळ्या पद्धती तुल्यमूल्य असल्यामुळे त्या तशाच राहू देणे इष्ट आहे. ह्या वैचित्र्यामुळे समाज दुर्बल होईल असे मानण्याचे कारण नाही. उलट असा समाज
लवचिक व प्रगमनशीलही असणे शक्य आहे.

{{right|{{xxxx-larger|+}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
8gqny2ykhx3e520d8t2vwiq3o01kmwv
पान:आमची संस्कृती.pdf/128
104
21507
237113
138699
2026-09-18T16:45:36Z
कल्पनाशक्ती
3813
237113
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १२१}}</noinclude>होईल.

{{gap}}उत्तर अमेरिकेच्या संघराज्यात जगातील जवळजवळ सर्व महत्त्वाच्या भाषा बोलणारे लोक येऊन वसाहत करून राहिले आहेत. तरीही संयुक्त संस्थाने हे एकभाषिक राष्ट्र आहे. असे होण्यास बरीचशी ऐतिहासिक व सांस्कृतिक कारणे आहेत. संस्थानात पहिल्यापासून बहुसंख्य इंग्रजी भाषिक लोक वसाहत करण्यास गेले. फ्रेंच वसाहती ह्या इंग्रज वसाहतवाल्यांनी नेपोलियनकडून विकत घेतल्या व इंग्रजी भाषिक वसाहतवाल्यांनी इंग्लंडपासून स्वतंत्र होऊन आपले निराळे राज्य स्थापले. जे काही थोडे डच, स्पॅनिश व फ्रेंच लोक होते त्यांना संख्याधिक्यामुळे व राजकीय सत्तेमुळे लवकरच इंग्रजी भाषिकांच्या वर्चस्वाखाली यावे लागले. एकदा राज्य स्थापन झाल्यावर गेल्या ५०/७५ वर्षांत इंग्रजी भाषिकांव्यतिरिक्त जे इतर लोक लाखोंच्या संख्येने संयुक्त संस्थानांत आले त्यांना नागरिकत्व मिळावयाच्या आधी इंग्रजी शिकावेच लागे. हे सर्व लोक आपल्या देशातील अन्नटंचाई किंवा राजकीय जुलूम ह्याला कंटाळून आसऱ्यासाठी आले होते. ह्या सर्व लोकांनी भरपूर अन्न, वस्त्र व स्वातंत्र्य ह्या तीन गोष्टींसाठी आपल्या भाषेची किंमत आनंदाने दिली. तरीही आज निरनिराळ्या भाषिकांचे गट, शाळा व वर्तमानपत्रे संयुक्त संस्थानात आहेत. मध्यवर्ती सरकार हे चालू देते, कारण ह्या भाषांना राजकीय जीवनात काडीचेही स्थान नाही.

{{gap}}स्वित्झर्लंडमध्ये तीन भाषा आहेत व त्या तीनही भाषांना राज्यात समान स्थान देऊन स्वित्झर्लंडने हा प्रश्न सोडवला. ह्या तीन भाषांमध्ये रोमॅन्स ह्या चवथ्या भाषेचीही नुकतीच भर पडली आहे. सगळ्या भाषांना समान स्थान देणे ह्या चिमुकल्या देशाला शक्य झाले. कारण, तेथे चारच भाषा आहेत, भारतासारख्या चौदा नाहीत. दुसरे म्हणजे इटालियन, फ्रेंच व रोमॅन्स ह्या जवळच्या भाषा आहेत व जर्मन इतकी जवळची नसली तरी भाषाशास्त्रदृष्ट्या फार लांबची भाषा नाही. ह्या चौभाषिकांना एकमेकांच्या भाषा चटकन शिकण्यासारख्या आहेत. तरीही एवढ्याशा चिमुकल्या व मोठमोठ्या भांडकुदळ राष्ट्रांच्या मध्यावर असलेल्या ह्या राष्ट्रांत चार भाषा शेजारी नांदू शकतात, प्रत्येकाला आपापल्या भाषेत सर्व शिक्षण घेता येते, इतर भाषिकांची गावे व शहरे आपल्यात ओढून घेण्याविषयी स्पर्धा नाही व<noinclude></noinclude>
4k32enjt72v08fstv59i8dovfkh7d4q
पान:आमची संस्कृती.pdf/129
104
21508
237114
138700
2026-09-18T16:49:12Z
कल्पनाशक्ती
3813
237114
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१२२ / आमची संस्कृती
</noinclude>भाषा विविध असूनही दोन महायुद्धांच्या प्रखर कसोटीला ह्या देशाचे एकराष्ट्रीयत्व उतरले आहे. ह्या गोष्टी आपल्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

{{gap}}सोव्हिएत रशिया मात्र एक प्रचंड बहुभाषिक राष्ट्र आहे. रशियन भाषा ही केंद्रराज्याची वा संघराज्याची भाषा आहे व घटक राज्यात बोलणे, शिक्षण व राज्यव्यवहार त्या त्या राज्याच्या भाषेतून चालतो.

{{gap}}रशियाची व भारताची परिस्थिती वरवर दिसायला सारखी दिसते व भाषाविषयक प्रश्नही भारताने थोडासा रशियाच्या धर्तीवरच सोडवल्यासारखा दिसतो. पण खरोखर पाहता सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्टीने रशिया व भारत ह्यांमध्ये फार मोठा फरक आहे व म्हणून रशियाचे उदाहरण उपयोगी पडण्यासारखे नाही.

{{gap}}रशियामध्ये कित्येक शतके रशियन भाषा बोलणारे लोक राज्यकर्ते होते. रशियात अस्तित्वात असलेले शास्त्र, वाङमय, संस्कृती व सर्व तऱ्हेचे शिक्षण ही रशियन भाषेतच केंद्रित झालेली होती. त्याचप्रमाणे ज्या राजकीय तत्त्वज्ञानाचे पुढारीपण आजच्या जगात रशियाकडे आहे, त्या तत्त्वज्ञानातील बरेचसे वाङमय रशियन भाषेतच आहे. कार्ल मार्क्स व एंगेल्स हे दोघे जर्मन भाषिक जरी त्या तत्वप्रणालीचे जनक असले तरी त्या तत्त्वांचे प्रमुख भाष्यकार व प्रचारक लेनिन, बुखारिन, स्टालिन वगैरे सर्व रशियनच होते. म्हणून आजच्या रशियन संघराज्याची राजकीय, सांस्कृतिक व ऐतिहासिक भाषा रशियन हीच ठरते. रशियातील घटक राज्यांपैकी कोठच्याही भाषेचा इतिहास वा वाङमय रशियन भाषेच्या तोडीचे नसल्यामुळे ती भाषा संघराज्याची भाषा व्हावी हे नैसर्गिकच होते. असे असूनही सध्याच्या रशियन राज्यकर्यांनी घटक राज्यांतील ज्याना लिपीदेखील नाही अशा भाषा जिवंत ठेवून सर्व शिक्षण त्या त्या भाषेतून देण्याची व्यवस्था केली आहे, ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.

{{gap}}'''भारताची वेगळीच परिस्थिती'''

{{gap}}ह्याउलट, भारतात सर्व उत्तरेकडच्या भाषा सांस्कृतिकष्ट्या एकाच पायरीवर आहेत. सुमारे १००० वर्षांपूर्वी प्राकृत भाषांपासून त्यांचा जन्म झाला व प्रत्येकीने आपापले वाङमय निर्माण केले. मला असे वाटते की बंगाली, मराठी व गुजराथी ह्या भाषांचे वाङमय उत्तरेकडच्या सिंधी,<noinclude></noinclude>
9op150p480wtlw4y08g5q6ioy79zz90
पान:आमची संस्कृती.pdf/130
104
21509
237115
138701
2026-09-18T16:52:27Z
कल्पनाशक्ती
3813
237115
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १२३}}</noinclude>पंजाबी, राजस्थानी, हिंदी आणि उडिया ह्या भाषांच्या वाङमयापेक्षा अधिक संपन्न व प्रगल्भ आहे. हिंदी भाषिकांची संख्या जरी इतर कुठचीही एक भाषा बोलणाऱ्या लोकांपेक्षा अधिक असली तरी हिंदी भाषेतील वाङमय इतर भाषांच्या मानाने गुणाने व परिमाणाने जरा मागासच वाटते. उत्तरप्रदेशात मुसलमानी सत्ता १३ व्या शतकापासूनच प्रस्थापित झाली व त्यानंतर सुशिक्षित वर्गाने प्रथम पर्शियन व १९ व्या शतकात ऊर्दू ह्या दोन परकीय भाषा आत्मसात केल्या. बहुजन समाजाने हिंदी भाषा जिवंत ठेवली.

{{gap}}दक्षिण भारतात द्राविड भाषांचे वाङमयीन कार्य अतिशय भरीव, डोळे दिपविणारे आणि जुने आहे. तामीळ वाङमय सर्व आधुनिक भारतीय भाषांमध्ये सर्वात जुने तर आहेच पण आधुनिक युरोपीय भाषांच्या वाङमयापेक्षाही जुने आहे. उत्तरेकडील भारतीय भाषा अस्तित्वात येण्याच्या आधीपासून तामीळ, तेलगु व कन्नड ह्या भाषा अस्तित्वात होत्या व त्यांची वाङमयीन परंपरा मोठी जोमदार असून दक्षिणेकडे उगम पावलेल्या तत्त्वज्ञानविषयक व धार्मिक विचारप्रवाहांची सर्व भारतावर छाप पडलेली आहे. ही परिस्थिती लक्षात घेतली म्हणजे रशियन व हिंदी ह्यांच्या स्थानातील मूलभूत फरक ध्यानात येईल. भारतीय भाषा एकाच पायरीवर आहेत एवढेच नव्हे, तर त्यांतील काही हिंदीपेक्षा वरचढ असताना हिंदीला जे नवीन महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे त्याबद्दल इतर भाषिकांना थोडेसे वैषम्य वाटल्यास नवल नाही.

{{gap}}रशियामध्ये रशियन भाषा ही संघराज्याची भाषा असल्यामुळे संघराज्यात रशियन भाषिकच मोठमोठ्या जागांवर सर्वत्र दिसून येतात. ह्याबद्दल इतर भाषिकांना फारसे वैषम्य वाटत नाही. कारण बाकीच्या बहुतेक भाषांतून लिहिलेले वाङमय जवळजवळ नाही. रशियन भाषिकांची संख्याही इतर सर्व भाषिकांइतकी किंवा कदाचित जास्तही असेल. बाहेरील जगाशी संबध ठेवायलाही ह्याच भाषेचा उपयोग रशियन लोक सर्रास करीत असत व हल्लीही करतात. रशियन भाषेचे स्थान तिला वाङमयीन मोठेपणाने व सांस्कृतिक हक्कानेच प्राप्त झाले आहे.

{{gap}}'''ऐतिहासिक पार्श्वभूमी'''{{nop}}<noinclude></noinclude>
2xiz16abq86zuw6r8jvkrmz67s442rc
पान:आमची संस्कृती.pdf/131
104
21510
237116
138702
2026-09-18T16:55:58Z
कल्पनाशक्ती
3813
237116
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१२४ / आमची संस्कृती
</noinclude>{{gap}}भारतात हिंदी भाषेला असे स्थान मुळीच नाही. वर वर्णन केलेल्या कोणत्याही राज्यासारखी भारताची परिस्थिती नाही. गेल्या ९०० वर्षांतील काही घडामोडींचा थोडक्यात उल्लेख केल्यास भारतीय भाषांबद्दलचा प्रश्न स्पष्ट होण्यास आणखी मदत होईल.

{{gap}}इसवी सन ९०० ते १००० च्या सुमारास अर्वाचीन उत्तरभारतीय संस्कृतोद्भव भाषा प्राकृतांतून वेगळ्या फुटल्या व त्यांचा जन्म झाला, हे वर सांगितलेच आहे. तरीसुद्धा संस्कृत ही विद्वानांची भाषा राहिली व साहित्य, संगीत, ज्योतिष व तत्त्वज्ञान ह्यांवर उत्तम लिखाण संस्कृतमध्ये होतच होते. अर्वाचीन भाषा हळूहळू बाळपण संपवून प्रौढ होत होत्या. काही तीनशे वर्षांतच प्रौढ दशेला पोचल्या हे महानुभावांच्या वाङमयावरून व ज्ञानेश्वरी व अमृतानुभवासारख्या ग्रंथांवरून दिसून येतेच. ह्या भाषांच्या जवळजवळ जन्ममुहूर्तावरच एका धर्मवेड्या परकीय सत्तेने भारतात प्रवेश केला. सन नऊशे-दहाशेच्या सुमाराची आक्रमणे सोडली तरी ११०० च्या सुमारास तुर्की लोकांनी हिंदुस्थानात प्रवेश करून मुसलमानी धर्म व पर्शियन भाषा व संस्कृती आणली. पहिल्यापहिल्याने लूट घेऊन निघून जाणारे हे लोक लौकरच जेते म्हणून स्थायिक झाले व आपला धर्मप्रसार त्यांनी जोरात सुरू केला. त्यांच्या दरबारी पर्शियन भाषा चाले व उत्तरप्रदेशातील लोकांनी ती भाषा आत्मसात केली व हिंदी मार्ग पडली. दक्षिणेकडे ह्या आक्रमणाला तोंड देण्यात इतके सामर्थ्य खर्च झाल की, त्यामुळे देशी भाषांची जरी गळचेपी झाली नाही तरी सर्वांगीण वाढ झाली नाही.

{{gap}}हिंदुस्थानातील काही प्रांत मुसलमानी अंमलाखाली ७०० वर्षे होते, तर काही २०० पेक्षा जास्त नव्हते. इंग्रज येण्याच्या अगोदर काही प्रांतांनी मुसलमानी अंमल झुगारून दिला होता व त्या त्या प्रांतात देशी भाषा वाङमयीनष्ट्या परत डोके वर काढू लागल्या होत्या. पण सर्वांगीण वृद्धी व्हावयास जी राजकीय सत्ता व स्वास्थ्य लागते ते आजपर्यंत ह्या भाषांना मिळाले नाही.

{{gap}}इसवी सनाच्या १६ व्या शतकात दक्षिणेकडील मुसलमानी राजाच्या दरबारात ऊर्दू भाषेतून वाङमयनिर्मिती होऊ लागली. ऊर्दू ही मूळ दिल्लीच्या आसपासच्या लोकांची बोलभाषा, म्हणजे हिंदी भाषेच्या<noinclude></noinclude>
8k1coxxoxu64tq69g2kccui109cdp70
पान:आमची संस्कृती.pdf/132
104
21511
237117
138703
2026-09-18T17:00:26Z
कल्पनाशक्ती
3813
237117
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १२५}}</noinclude>उपप्रकारांपैकी एक होती. काही लोक तिच्यात पर्शियन व अरबी शब्दांची खैरात करून वापरू लागले तर काही शुद्ध देशी शब्द वापरीत. पर्शियन व अरबी शब्दांचा भरणा खूप झाल्याने त्या भाषेची लिपीही अरबी बनली व मुसलमानी राजवटीत दरबारी भाषा पर्शियन व शिपायांची भाषा ऊर्दू असे झाले व बहुतेक मुसलमानांनी ती उचलली. तरी प्रत्येक प्रांतांतील खेडेगावातील मुसलमानांना ऊर्दूही येत नसे व पर्शियनही येत नसे. ते त्या त्या प्रांतांतीलच भाषा बोलत. ऊर्दू ही कोणत्याही प्रांताची भाषा नव्हती. पण काही सामाजिक थरांतून सर्व हिंदुस्थानभर तिचा प्रसार झाला. पुढे इंग्रजांनी हीच भाषा आपल्या लष्करांत शिकविल्यामुळे इंग्रजी राजवटीत तिच्या प्रसाराला अधिकच वाव मिळाला.

{{gap}}'''इंग्रजीचे दूरगामी परिणाम'''

{{gap}}इंग्रज १५ व्या शतकापासून हिंदुस्थानात आले. त्यांचे एकछत्री राज्य भारतात दोनशे वर्षेच टिकले. हे राज्य जरी २०० वर्षेच टिकले, तरी त्याचे भारतावर झालेले परिणाम फारच दूरगामी स्वरूपाचे आहेत. इंग्रजांच्या आधी संबंध भारतावर एकछत्री राज्य कुठच्याही काळात नव्हते. एक शासनव्यवस्था कुठच्याही काळात नव्हती.

{{gap}}इंग्रजांच्या राज्यातही नव्या धर्माचा प्रचार व प्रसार खूप झाला, पण भारतावर मुख्य परिणाम नव्या धर्माचा न होता, नव्या यंत्रयुगीन उत्पादनाचा, समाजव्यवस्थेबाबतच्या व राज्ययंत्राबाबतच्या तत्त्वप्रणालीचा झाला. प्रजासत्ताक राज्य, प्रत्येक स्त्री-पुरुषाला मतदानाचा हक्क, जातिविरहित समाजव्यवस्था, सर्वांना एक कायदा ह्या भारताच्या घटनेतील मूलभूत गोष्टी इंग्रजांच्यामुळे आपल्यात आल्या आहेत व त्या गोष्टींचा अभिमान जागृत होण्यास मुख्यत्वे इंग्लिश वाङमयच कारणीभूत झाले.

{{gap}}इंग्रजी राज्यकर्ते बरोबर इंग्लिश भाषा घेऊन आले व मेकॉलेच्या तत्त्वामुळे ती भाषा भारतीय शिक्षणपद्धतीत शिरली. इंग्रजी वाङमय जगातील पुढारलेल्या व संपन्न वाङमयापैकी आहे. त्यातील धार्मिक मतप्रणालीमुळे नव्हे, तर सामाजिक व राजकीय प्रतिपादनामुळे त्या वाङमयाने भारतीयांना जीवनाचे एक नवीनच दालन खुले झाल्यासारखे<noinclude></noinclude>
sd7evkbpwcu9gsqzhon8wmpltpm5tg1
पान:आमची संस्कृती.pdf/133
104
21512
237118
138704
2026-09-18T17:07:46Z
कल्पनाशक्ती
3813
237118
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१२६ / आमची संस्कृती
</noinclude>वाटले असल्यास नवल नाही. सर्व हिंदुस्थानात सर्व प्रांतांतून राजभाषा म्हणून पोटासाठी, व संपन्न वाङमयाच्या लालचीने कित्येक लोक ही भाषा आवडीने शिकले, ह्याच लोकांनी समाजसुधारणेचा व स्वातंत्र्य लढ्याचा झेंडा उभारला. स्वतंत्र भारताची घटना मूळ ह्या भाषेतच घडली व नंतर तिला देशी स्वरूप दिले गेले. ह्याच भाषेच्या द्वारे पाश्चात्त्यांच्या ज्ञानाचे भांडार भारतीयांना खुले झाले.

{{gap}}इंग्रजी भाषा बोलता येणारे बहुतेक भारतीय जन्माने आपली स्वतःची अशी भारतीय भाषा बोलणारे होते व आहेत. पण काही अल्पसंख्याक, विशेषतः मिश्र इंग्रज रक्ताचे लोक आपण राज्यकर्त्यांच्या रक्ताचे व त्यांना जवळचे ह्या भावनेने की काय, भारतीय भाषांचा त्याग करून इंग्रजीच आपली मातृभाषा म्हणून मानू लागले. अशांना इंग्रजी राजवटीत लाभही चांगला झाला व कित्येक दृष्टींनी हे लोक भारतीय संस्कृती व समाजजीवन ह्यांपासून अलिप्त राहिले. ह्यांची जन्मभूमी व कर्मभूमी भारतच असल्यामुळे इंग्रजांचे कितीही अनुकरण ह्यांनी केले तरी त्यांना इंग्रजी संस्कृती कधीही आत्मसात करता आली नाही. हिंदुस्थानातील सर्व प्रांतात हे लोक विखुरलेले आहेत.

{{gap}}इंग्रजी राज्यात सर्व प्रांतांतील लोकांना नोकऱ्या लागत व या सर्व नोकरांच्या सर्व देशभर बदल्या होत. अशा लोकांना इंग्रजी भाषेमुळे परस्पर दळणवळण करता येई व इंग्रजी शिक्षणामुळे नोकरीतही लाभ मिळे. ह्यामुळे सरकारी नोकरांत, विशेषतः वरच्या पगाराच्या सरकारी नोकराच्या कुटुंबातूनही मुलांना लहानपणापासून इंग्रजी शिक्षण देण्याचा प्रघात वाढला व ही कुटुंबेही भारतीय भाषांना तुच्छ लेखू लागली. ह्याचा असा परिणाम झाला की, भारतीय वंशाचे असूनही ह्यांपैकी कित्येक लोक इंग्रजी आपली जन्मभाषा म्हणून सांगू लागले.

{{gap}}बहुतेक शाळांतील वरच्या वर्गातून व विद्यापीठातून इग्रजी बोधभाषा असल्यामुळे सर्वच उच्च शिक्षण बहुजन समाजाला कठीण होऊ बसले. अशा परिस्थितीत स्वातंत्र्य मिळून भारताचे स्वतंत्र प्रजासत्ताक संयुक्त राज्य प्रस्थापित झाले. प्रजासत्ताक राज्याची भाषा काय असावा, हा प्रश्न उपस्थित होऊन ती हिंदी असावी असे घटनेत ठरले. पण अजून लोकमत सर्वस्वी त्या बाजूने नाही व विशेष विरोध दाक्षिणात्यांचा आहे.<noinclude></noinclude>
0o392mkdsl3dpxof0kh88w0lti5qrpl
पान:आमची संस्कृती.pdf/134
104
21513
237119
138705
2026-09-18T17:11:11Z
कल्पनाशक्ती
3813
237119
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १२७}}</noinclude>हा विरोध केवळ भांडकुदळपणामुळे आलेला नसून त्याच्यामागे योग्य कारणे आहेत हे आपण वर पाहिलेच आहे. दुसरे असे की, प्रत्येक प्रांतातून, विशेषतः बहुभाषिक प्रांतांतून प्रांतिक भाषेचे उच्चाटन करून उच्च शिक्षण हिंदीतूनच व्हावे असा प्रचार चालला आहे व त्यामुळेही अशा प्रांतांतील इतर भाषिकांना आपली मायभाषा स्वतंत्र भारतात वृद्धीस लागण्याऐवजी मरून जाईल की काय अशी शंका येते. तिसरा मुद्दा असा आहे की हिंदी केंद्रभाषा केल्यामुळे ज्यांची मातृभाषा ती आहे अशा लोकांना सरकारी दरबारी व सर्व परीक्षांतून मोठा फायदा मिळतो व त्यामुळेही इतर भाषिकांना आपल्यावर उगीचच अन्याय झाल्यासारखे वाटते.

{{gap}}'''घटक राज्याची स्वभाषा, संघराज्याची इंग्रजी भाषा'''

{{gap}}हिंदुस्थानचा इतिहास लक्षात घेऊन ह्या सर्व अडचणीतून न्यायाने मार्ग काढला तर तो सर्वांना पसंत पडून, राजकीय दृढीकरणास मदत करणारा होईल असे वाटते. त्याचे खाली थोडक्यात दिग्दर्शन करते.

{{gap}}१.हिंदुस्थानात बोलल्या व लिहिल्या जाणाऱ्या तेरा भाषा त्या त्या प्रांतांच्या भाषा म्हणून समजल्या जाव्या, ह्यांत ऊर्दू व इंग्रजीचा अंतर्भाव होऊ नये. कारण ह्या दोन्हीही प्रादेशिक भाषा नाहीत. कोणाही माणसाला मातृभाषा म्हणून इंग्रजीत शिक्षण मिळू नये.

{{gap}}२.त्या त्या प्रांतांच्या भाषेत अगदी सुरुवातीपासून तो उच्चतमपर्यंत शिक्षण त्या त्या प्रांतात व्हावे. घटक राज्य म्हणजे एकभाषिक किंवा द्विभाषिक प्रांत (होता होई तो एकभाषिक) असे ठेवले तर त्या राज्याची बोधभाषा व राज्यतंत्राची भाषा त्या प्रांताची भाषा असावी. ह्या प्रांतात काही शहरांतून इतर भाषिक असले व त्यांची संख्या मोठी असली तर त्यांना स्वतःच्या भाषेतून शिक्षणाची व्यवस्था व्हावी. काही झाले तरी भाषिक आक्रमणाला उत्तेजन देऊ नये. तलवारीच्या जोरावर राज्य मिळवायचे दिवस गेले आहेत. आपण सर्व एका मोठ्या राज्याचे घटक आहोत व लेखणीने किंवा बेजबाबदार प्रचार करून घटक राज्याच्या सीमा वाढवण्याचा प्रयत्न करून आंतरप्रातीय वितुष्टे वाढविणे हे आत्मघाताचे लक्षण आहे. पण त्याचबरोबर 'हिंदी नको' म्हटले म्हणजे देशद्रोह<noinclude></noinclude>
9aw93ouwy1kvej7javacyjbvgprv5oe
पान:आमची संस्कृती.pdf/135
104
21514
237120
138706
2026-09-18T17:16:59Z
कल्पनाशक्ती
3813
237120
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१२८ / आमची संस्कृती
</noinclude>केल्यासारखे होते असे म्हणणेही सर्वस्वी चूक आहे. सर्व भाषा एका पायरीवरच्या समजाव्या व कोणत्याही एकीला केंद्रीय भाषा म्हणून प्राधान्य देऊ नये.

{{gap}}३.प्रत्येक घटकाची भाषा निरनिराळी झाली तर सर्वांना एकमेकांशी संबंध ठेवण्यास व केंद्रीय राज्याची म्हणून एक भाषा हवीच. त्याशिवाय बाहेरच्या जगाशी राजकीय संबंध ठेवण्यास व पाश्चात्यांची विद्या हस्तगत करण्यास एका भाषेची आवश्यकता आहे. ती इंग्रजी असावी. मॅट्रिकच्या आधी तीन वर्षे ही भाषा शिकवण्यास सुरुवात करावी. शिकवण्याचा उद्देश वाचता यावे व सोपे बोलता व लिहिता यावे इतकाच असावा. विद्यापीठातील सर्व वर्गांना ही भाषा आवश्यक असावी व तेथेही उद्देश वाङमयीन प्रवीणता व सखोल अभ्यास नसून, फक्त शुद्ध लिहिता, बोलता येणे व वाचता येणे एवढाच असावा.

{{gap}}४.भारतातील सर्व भाषा शक्य तितक्या लौकर एका लिपीत लिहिण्याची व्यवस्था व्हावी. कोठच्याही एका भाषेला प्राधान्य नसले म्हणजे आपली लिपी सोडण्यास निरनिराळे भाषिक तयार होतील व एक लिपी झाली म्हणजे आंतरप्रांतीय वाङमय वाचण्याची जिज्ञासा उत्पन्न होईल. आंतरप्रांतीय सांस्कृतिक दळणवळण वाढून भारतीय संस्कृतीत भर पडेल.

{{gap}}ह्या योजनेने सर्व भाषांना सारखे स्थान मिळेल. कोणत्याही एका गटाचा भाषेमुळे फायदा होणार नाही. सर्वांचे शिक्षण भारतीय भाषांमध्येच होईल. इंग्रजी फक्त आंतरप्रांतीय व आंतरदेशीय दळणवळणाचे साधन राहील. इंग्रजी ही सर्वांनाच परकी असल्यामुळे एकाला फायदा एकाला तोटा असे होणार नाही. प्रत्येकाला स्वभाषा व इंग्रजी अशा दोनच भाषा शिकाव्या लागतील. हल्ली तीन शिकाव्या लागतात. शिक्षणक्रम सुटसुटीत होतील. व सर्व देशाची लिपी एक झाल्यास बहुरूपी भारतीय संस्कृतीचा वाङमयद्वारा आस्वाद घेण्यास सर्व भारतीयांना सोपे जाईल. घटक राज्यात जवळजवळ सर्व नोकऱ्या त्या त्या भाषिकांना मिळतील. काहीं थोडे अपवाद होतील. पण इतरांना ज्या प्रांतात राहावयाचे तेथली भाषा शिकावी लागेल.

{{right|{{xxxx-larger|+}}}}{{nop}}<noinclude></noinclude>
15xte0eycppd19uacnlwfvnas5kp0ca
पान:आमची संस्कृती.pdf/136
104
21515
237121
138707
2026-09-18T17:20:08Z
कल्पनाशक्ती
3813
237121
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १२९ }}</noinclude>

'''११. दोन पिढ्या'''

{{gap}}'''तरुण पिढीला वळण का नाही?'''

{{gap}}रत्नागिरीचे श्री. आप्पासाहेब पटवर्धन ह्यांनी आपल्या आयुष्याच्या आठवणी देताना एका व्यक्तीचे एक लहानसेच, पण हृद्य चित्र रंगविले आहे. ती व्यक्ती म्हणजे आप्पासाहेबांची आत्याबाई. ह्या आपल्या भावाशेजारी बिऱ्हाड करून, अति दारिद्र्यात, पण मानाने राहत असत. वयाने मोठ्या असूनही आपल्या लहान भाचरांच्या खेळण्या-बागडण्यात त्या भाग घेत, वेळप्रसंगी आपल्या उदाहरणाने, शिकवणुकीने आयुष्यातील मूल्यांचे ज्ञान देत व त्याबरहुकूम थोडीबहुत कृती करवीत. त्या लवकर वारल्यामुळे लहान भावंडांना त्यांचे दर्शन व मार्गदर्शन दोन्हीही झाली नाहीत, म्हणून लेखकाला फार हळहळ वाटते. अशा व्यक्ती हल्ली समाजात नाहीत म्हणून तरुण मुलामुलींना नीट मार्गदर्शन होत नाही असे काहींचे म्हणणे आहे. अशा बायकांसारख्या व्यक्ती आज दिसत नाहीत व पूर्वी घरोघर होत्या असे स्पष्टपणे व मोठेपणे कोणी कदाचित म्हणणार नाही, पण बहुतेकांच्या मनातून तसे असते. खरोखरच अशा त्यागी व्यक्ती कुटुंबात हल्ली सापडत नाहीत का? त्या नसल्यामुळे हल्लीच्या तरुण पिढीला लागावे तसे वळण लागत नाही, असे म्हणता येईल का? हल्लीच्या मुली, मुलगे पूर्वीच्या पिढीपेक्षा वागुणकीने हीन आहेत का? असे<noinclude></noinclude>
n4ahkisfgb44rzdodyjxxouoshughq0
पान:आमची संस्कृती.pdf/137
104
21516
237122
138708
2026-09-18T17:23:54Z
कल्पनाशक्ती
3813
237122
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१३० / आमची संस्कृती
</noinclude>नाना प्रश्न उद्भवतात. ह्या प्रश्नाचे उत्तर 'हो' किंवा 'नाही' असे नुसते देऊन भागणार नाही. मागच्या पिढीत घरांतले वातावरण काय होते हे पण पाहिले पाहिजे.

{{gap}}'''पूर्वीच्या स्त्रीचे जीवन चार भिंतीत'''

{{gap}}मागच्या पिढीतील स्त्रियांचे जीवन सर्वस्वी घराच्या चार भिंतीत होते.

{{gap}}जरी अशा काही स्त्रिया होऊन गेल्या, की त्यांनी नवऱ्याच्यामागे शेतीवाडी व मोठ्या संसाराची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली, तरी त्यामुळे वरील विधानाला बाधा येत नाही. आजच्या चर्चेत हे लक्षात ठेवले पाहिजे की, कुठचाही नियम सांगितला की, त्याला अपवाद असणारच. चर्चा जिवंत समाज व त्यातील जिवंत व्यक्तीविषयी असल्यामुळे कोणत्याही गोष्टीबद्दल ठाम निरपवाद असे विधान करणेच शक्य नाही. काही स्त्रिया काही विशिष्ट परिस्थितीत मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडीत, पण एकंदरीने त्यांचे आयुष्य चार भिंतीत, मोठ्या कुटुंबात असे.

{{gap}}अशा बऱ्याच कुटुंबात एखाददोन विधवा बाया असत. त्या कधी गादीवर निजत नसत, रात्रीचे जेवत नसत, त्यांचे उपासतापास बरेच असत, बहुधा घरातील मुख्य स्वैपाक (दुपारचा) त्याच करीत व संध्याकाळचा स्वैपाक दुसऱ्या कोणी केला तर त्या अंगणात मुलांना सांभाळीत बसत, त्यांचा पोषाख नेहमी तांबड्या कावेच्या रंगाचे लुगडे असा एक वस्त्राचा असे. चोळी असलीच तर बिनकाठाची पांढरी असे. कधी त्या एवढे तेवढे फराळाचे, उपवासाचे घेऊन खात बसल्या तर भोवती मुले गोळा होऊन त्यांतील काही भाग फस्त करीत. अशा बायका त्याग व सेवा ह्यांच्या मूर्तीच होत्या असे कित्येकांचे म्हणणे आहे.

{{gap}}'''त्याग केला की करवला गेला?'''

{{gap}}ह्याबद्दलचे माझे म्हणणे काय ते समजण्यासाठी मी एक उदाहरण घेते. काही दिवसांपूर्वी तीन जैन साधुनी आमच्या घराला भेट दिली. हे साधू जैनांच्या तेरापंथी संप्रदायापैकी होते. त्यांना स्वतःचे घरदार नव्हते. पाच घरी मागून जे अन्न मिळेल तेवढेच ते दिवसातून एकदा खातात. हिंसा<noinclude></noinclude>
ms82k6y1rq0p4e0ritkpxe19tyils9l
पान:आमची संस्कृती.pdf/138
104
21517
237123
138709
2026-09-18T17:26:50Z
कल्पनाशक्ती
3813
237123
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १३१ }}</noinclude>होईल ह्या भीतीने कोणच्याही वाहनाने न जाता पायी चालतात. वर्षाकाठी हजार मैल तरी त्यांचे चालणे होत असेल. किती थकले भागले किंवा आजारी पडले तरी गृहस्थाश्रमी लोकांकडून कसलीही सेवा करून घेत नाहीत. दिवसा निजत नाहीत. पायांत जोडा घालीत नाहीत. लेखन, चित्रकाम, स्वतःचा कमंडलु व खाण्याचे भांडे लाकूड तासून तयार करणे किंवा लाखवणे, दोऱ्या, गोफ (ग्रंथ बांधण्यासाठी किंवा चवरी करण्यासाठी) विणणे, कापड शिवणे असा उद्योग हाताने चाललेला असतो. अखंड चिंतन, मनन व वाचन चालू असते. दरवर्षी गुरू आज्ञा देईल त्या भागात संचार असतो. हे सर्व स्वामी तरुण म्हणजे तिशीच्या आतील होते. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी, दहाव्या वर्षी, अकराव्या वर्षी दीक्षा घेतल्या होत्या व तेव्हापासून पहिल्याने अध्ययन व नंतर अव्याहत संचार चालू आहे. कोणीही मनुष्य (पुरुष किंवा बाई) तीस वर्षांचे व्हावयाच्या आत त्याला अशा तऱ्हेची शिक्षा देणे हा गुन्हा होईल असा कायदा सध्या भारत सरकार करीत आहे, त्याविरुद्ध स्वामी प्रचार करीत होते. स्वामींचे वाचन, अभ्यास, तपस्या, ह्या सर्वांबद्दलच्या आदराने माझे मस्तक नम्र झाले. तरुण वयात जगातील सर्व सुखे टाकून अखंड संचार करण्याच्या व्रताने आम्ही सर्व थक्क झालो, पण स्वामींच्या प्रचाराला माझ्याकडून होकार मिळेना, दहाव्या अकराव्या वर्षी ब्रह्मचर्य, संन्यासदीक्षा ह्याचा अर्थ तरी मुलांना कळेल का? त्या वेळी सर्वांसमक्ष घोषणा करून दीक्षा घेऊन, नंतर गुरुगृही राहून सर्वांच्या मेळाव्यात शिक्षण घ्यावयाचे असे ह्या पंथांतील बरेच लोक करतात. दीक्षा घेतल्यावर काडीचेही स्वातंत्र्य नसते. बालपण खडतर अशा यमनियमांत जाते. दिवसाचे चोवीस तास दुसऱ्याच्या सान्निध्यात असल्यामुळे यमनियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. पुढे संचारास निघाले तरी कधीही एकटे नसतात. एकमेकांचे एकमेकांवर लक्षही असते. अशा तऱ्हेने सगळीकडून बंदिस्त असले म्हणजे हळूहळू वैराग्य अंगी बाणतही असेल. पण अशाही परिस्थितीत पळून जाऊन परत गृहस्थाश्रमी बनलेले जैन गृहस्थ मी पाहिले आहेत. ह्या साधूंची तपस्या व त्याग असामान्य तर खराच, पण तो त्याग त्यांनी केला की त्यांच्याकडून करवला गेला, हा प्रश्न मनामध्ये येतोच.{{nop}}<noinclude></noinclude>
bbpqkeame3oyek0wf0izk6dbcewwky2
पान:आमची संस्कृती.pdf/139
104
21518
237124
138711
2026-09-18T17:29:44Z
कल्पनाशक्ती
3813
237124
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१३२ / आमची संस्कृती
</noinclude>

{{gap}}'''विधवा त्यागमूर्ती की कारुण्यमूर्ती'''

{{gap}}पूर्वीच्या विधवा बायांची तपस्या तर ह्या साधूंहूनही खडतर वाटते. साधू व स्वामीजी नेहमी इतर साधू व शिष्य-परिवार ह्यांचे संगतीत असतात. अध्ययन व चिंतन ह्यांत वेळ घालवतात. त्यांच्या तपस्येबद्दल समाज त्यांचा आदर करतो. वयाच्या अकराव्या की आठव्या वर्षी क्षणभरच्या उमाळ्याने का होईना, न समजता, वडील माणसांच्या भरीने का होईना, पण त्याने स्वतःहून संन्यासदीक्षा घेतलेली असते. बिचाऱ्या जुन्या काळच्या विधवेची तपस्या सर्व बाजूनी जास्त खडतर असे. कोवळ्या वयात लग्न म्हणजे काय हे नीट समजायच्या आधीच तिचे लग्न झालेले असे. गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदारीची जाणीव नसली, शरीरसुखाची कल्पना नसली तरी दागदागिने, कपडेलते वगैरे सौभाग्यश्रृंगार करण्याची, मंगळागौरीसारखी गोड व्रते पाळण्याची, सासरमाहेर, माहेरसासर अशा फेऱ्या घालण्याची तर तिची खासच कल्पना असणार. अशा वेळी विधवा होणे म्हणजे केवढा आघात! गृहस्थाश्रमाची पहिली पायरी चढतानाच जबरदस्तीने बिचारीला संन्यासाची दीक्षा मिळे. लगेच मुंडण, कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे हे विधी होऊन तांबडे वस्त्र मिळे. नाही अभ्यास, नाही लिहिणेवाचणे. नाही मननध्यान. केवळ शारीरिक कष्ट मात्र तिच्या नशिबी असत. समाजात मान-सन्मान तर दूरच, पण ती म्हणजे एक चालताबोलता अपशकुन असे. लग्न, मुंज, मंगळागौर, डोहाळजेवण, बारसे, असे गृहस्थाश्रमाचे सुखसोहाळे घरी चालले म्हणजे मरमर काम करायचे, पण कुणाला आपले तोंड दाखवावयाचे नाही, अशी शिस्त असे. जैन साधु निदान गृहस्थापासून चार हात लांब राहतात; पण बिचाऱ्या विधवेला गृहस्थाश्रमी होणाऱ्या पूर्वीच्या काळच्या, अत्यंत सूचक अशा सोहळ्यात राहून संन्यासी राहणे भाग होते. त्यांना त्यागमूर्ती म्हणावे, की कारुण्यमूर्ती म्हणावे, की समाजाच्या कठोरतेची चालती बोलती निदर्शने म्हणावे हे ज्याचे त्याने ठरवावे .

{{gap}}'''विधवांच्या वागण्याचे चार प्रकार'''

{{gap}}अशा स्त्रियांचे चार पंथ मी पाहिले आहेत. काहींच्या सुखलोलुप<noinclude></noinclude>
m80paqgncmozdlmllonsp66fy4a32nh
पान:आमची संस्कृती.pdf/140
104
21519
237125
138712
2026-09-18T17:41:12Z
कल्पनाशक्ती
3813
237125
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १३३}}</noinclude>मनोवृत्ती हळूहळू मरून जातात, मन धर्माचरणाकडे लागते. घरची मंडळी सात्विक वृत्तीची असतील तर घरात मान मिळतो. प्रेम मिळते व अशा बाया त्यागमय व प्रेममय होऊन राहतात. त्यागाची सुरुवात जुलमाने असली तरी तो अंगी बाणतो- पण त्यांच्या त्यागावर व प्रेमावर पोसून त्यांचे गुणगान करणारे कुटुंबीय मात्र स्वार्थी किंवा स्वार्थी नसल्यास आंधळे असे मला खचित वाटते. लहानपणी अशा व्यक्तींच्या सहवासात मन उदात्त बनेल, ह्या व्यक्तींच्या त्यागाची मुळे कशात आहेत ते कळणार नाही. पण मोठेपणी तरी त्यावर विचार सुचून निदान करुणा तरी उत्पन्न झाली पाहिजे. तीही उत्पन्न न होणारे व स्वतःच्या विधवा बहिणी, भावजया, मावशा, आत्या, ह्यांच्याकडून कुटुंबाची विनामूल्य यथेच्छ सेवा करून घेणारे व समाजात मानसन्मान असलेले कितीतरी पुरुष व स्त्रिया मी पाहिल्या आहेत. अशा तऱ्हेच्या त्यागाने त्या विशिष्ट व्यक्तीचा काय गुणविकास होत असेल तो होवो, पण कुटुंबावर व समाजावर होणारा परिणाम खात्रीने इष्ट नाही.

{{gap}}दुसऱ्या काही स्त्रिया एकत्र कुटुंबातील काही पुरुषांच्या कामवासनेला बळी पडतात. व्यवहारांतही खुषीपेक्षा जुलूमजबदरस्ती जास्त असे. संन्यास जसा जुलमाचा, तशाच जुलमाने घरातील भोगदासी होऊन काहींना राहावे लागते. ह्या दुःखाला वाचा फोडता येत नाही. घरातल्या बऱ्याच जणांना हा प्रकार माहीत असूनही प्रतिकार करण्याची छाती नसे.

{{gap}}तिसऱ्या प्रकारच्या विधवा स्त्रिया फशी पडत. घरात कोणीच त्राता नसल्याने घर सोडून जावे लागे व त्या धंद्यांत पडत. अशा स्त्रियांचे अतिवास्तव चित्रण कै. हरिभाऊ आपट्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून केलेले सर्वांनी वाचलेच असेल.

{{gap}}चौथ्या तऱ्हेच्या बाया वडीलधारे माणूस असेल तोवर ताटाखालचे मांजर असतात. एखादा मुलगा असेल तर तो मोठा होऊन मिळवू लागेपर्यंत गुलामगिरीत राहतात. पण त्यांच्या नशिबाने तो मिळवता झाला तर त्याचे लग्न लावून देऊन सुनेला यथेच्छ छळून काढतात. ह्या स्वतः संसारातून अशा वेळी उठलेल्या असतात की, त्यांच्या सर्व वासना अपुऱ्या राहिलेल्या असतात व त्या त्या सुनेच्या संसारातून पुरवू बघतात. मुलाचे<noinclude></noinclude>
7w5y7ka2hn640xk6l5wk5wuoqogk8o4
पान:आमची संस्कृती.pdf/141
104
21520
237126
138713
2026-09-18T17:47:04Z
कल्पनाशक्ती
3813
237126
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१३४ / आमची संस्कृती
</noinclude>स्वतःच्या बायकोवर प्रेम असलेले ह्यांना बघवत नाही, नातवंडे आपल्या आईभोवती पिंगा घालताना बघवत नाही, कोणी काय खावे, कसे खावे, किती खावे, काय ल्यावे वगैरे सर्व गोष्टींवर त्या हुकूमत ठेवू पाहतात. अपुऱ्या वासनांचे हे जिवंत भूत ज्या संसारात असेल तो संसार किती भयानक असेल हे सांगणे नकोच.

{{gap}}'''त्यागाचे स्वरूप बदलून गेले'''

{{gap}}अशा चारी तऱ्हेच्या स्त्रिया आजही पुष्कळ ठिकाणी दिसतात. पण समाजाच्या ज्या परिस्थितीमध्ये त्या निर्माण झाल्या ती परिस्थितीच पांढरपेशा वर्गात बदलली असल्यामुळे प्रत्येक कुटुंबातून त्या दिसत नाहीत. किंवा त्यागाचे स्वरूपच बदलून गेले आहे असे म्हणणे जास्त बरोबर होईल. आपण अविवाहित राहून भावांचे किंवा बापाचे संसार करणारे स्त्री-पुरुष माझ्या पाहण्यात आहेत. अशांचा त्याग गतकालीन विधवांपेक्षाही जास्त सरस वाटतो. आपल्या भावंडांकडे किंवा आपल्या आईबापांकडे दुर्लक्ष करून स्वतःचा संसार थाटणारे कितीतरी असतात. थोडा स्वार्थ, थोडा परार्थ करणारेही असतात. पण स्वतःचे सुख बाजूस सारून परार्थ आयुष्य झिजवणारे खरोखर विरळा. समाजाने अशांना स्वार्थाचा मार्ग मोकळा ठेवला असूनही ते तो टाळतात. दुसरा मार्ग मोकळा नसल्याने संन्यस्त जीवन कंठणाच्यांपेक्षा हा हल्लीच्या युगात कधी कधी दिसणारा संन्यास मला जास्त मोलाचा वाटतो.

{{gap}}'''दोन पिढ्यांत बदललेले जीवन'''

{{gap}}अशा स्त्रिया कुटुंबामध्ये असल्यामुळे व त्यांच्या शिकवणीमुळे मुलांच्या मनावर योग्य परिणाम होई व आता तसा होईनासा झाला आहे असा दुसरा मुद्दा कोणी काढतात. या मुद्याच्या बुडाशी खरोखर दोन विधाने आहेत. हल्लीची मुले पूर्वीच्या पिढीइतकी कष्टाळू, विनयशील, समाधानी व त्यागी नाहीत हे एक विधान व ती तशी होण्याला लागणारे आदर्श स्त्री पुरुष, विशेषतः स्त्रिया सध्याच्या कुटुंबातून नाहीत, हे दुसरे विधान. यांपैकी दुसऱ्या विधानाबद्दल त्रोटक चर्चा वर केलीच आहे. आता राहिले पाहिले विधान. त्याबद्दल विचार करू. पूर्वीच्या पिढीतील मुलांचे व<noinclude></noinclude>
9aun7hnecevkarg8fi0fsqz7pqarzdx
पान:आमची संस्कृती.pdf/142
104
21521
237127
138714
2026-09-18T17:51:07Z
कल्पनाशक्ती
3813
237127
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १३५}}</noinclude>मोठ्यांचे विश्व संकुचित असे. आपले कुटुंब हेच विश्व कित्येक वर्षे मुलांचे असे. मुलगे व मुली हल्लीइतक्या लहानपणी शाळेत जात नसत. त्याचप्रमाणे घराबाहेरचे मोठे विश्व म्हणजे शाळा होती. ती नुसती शिक्षणाचे साधन नसून करमणुकीचेही साधन असे. आई-बाप मुलांवर करडी देखरेख ठेवीत, असेही म्हणवत नाही. मुली शाळेत जात नसल्यामुळे बहुतेक घरीच असत. आता घरचे व बाहेरचे जग बदलले आहे. घरची शिस्त व आईबापांची देखरेख नुसती जास्त पाहिजे असे नव्हे, तर समजून पाहिजे व जितकी मुलांवर हवी तितकीच स्वतःवरही हवी. हल्लीच्या पिढीत जीवन कितीतरी गुंतागुंतीचे व अवघड झाले आहे.

{{gap}}'''मुलींच्या वागणुकीतील फरक'''

{{gap}}कोकणातले खेडे राहिलेच, पण पुण्यासारख्या शहरांतसुद्धा मुलाचे लक्ष वेधेल अशा गोष्टी किती कमी होत्या! फर्ग्युसनपासून हुजूरपागेपर्यंत चालत गेले तर 'वामन गोपाळ यांचा सार्सापरिला' व कधी कधी 'संगीत सौभद्र' संगीत मानापमान' या जाहिराती दिसत. दुकानांना मोठमोठ्या काचेच्या खिडक्या व त्यांत आकर्षक रीतीने मांडून ठेवलेले जिन्नस कधीच दिसत नसत. इराणी लोकांची चहा-फराळाची दुकाने तर मुळीच नव्हती. मुख्य म्हणजे निरनिराळ्या सिनेमांतील रंगीत दृश्ये, व त्यांत काढलेले वास्तवापेक्षा आकाराने कितीतरी मोठे व रंगाने कितीतरी जास्त भडक स्त्री-पुरुष तर डोळ्यापुढे नसतच. घरचे गरिबीचे वातावरण, क्वचित एखाद्या लहान बोळांतल्या मोठ्या वाड्यात तीन चार खोल्यांचे बिऱ्हाड, सर्व चुली पेटल्या म्हणजे वाडाभर धूर, या सर्वांतून बाहेर जाऊन शाळेत चारपाच तास घालवावयाचे म्हणजे एक तऱ्हेची पर्वणीच वाटावयाची. शाळेत काय किंवा घरी काय, वाचावयास जे वाङ्मय मिळे ते हल्लीच्या मानाने अतिशय कमी व अतिशय निराळ्या तऱ्हेचे असे. घरात मुलींना किंवा मुलांना कसे वागावयाचे याचे धडे सारखे केव्हाही मिळत नसतच. पण विशेषतः मुलींना घरात लहानसहान कामे असत. आपले, क्वचित एखाद्या लहानसहान भावंडाचे कपडे धुणे, थोडे पाणी भरणे, पाटपाने करणे, उष्टी काढणे व खालच्या भावंडांना खेळवणे ही कामे तर नेहमी असत. पण त्याशिवाय आई बाहेरची झाल्यावर तीन दिवस स्वयंपाक<noinclude></noinclude>
ln4bzqu6rqi4dypq32zyf6chre0838h
पान:आमची संस्कृती.pdf/143
104
21522
237128
138715
2026-09-18T17:57:11Z
कल्पनाशक्ती
3813
237128
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१३६ / आमची संस्कृती
</noinclude>करून शाळेत येणाच्या मुलीही कितीतरी होत्या. त्या वेळी रंगीबेरंगी छापील पातळे मिळत नसत. शाळेतल्या मोठ्या मुलींचा पोषाखं म्हणजे हिरवे, काळे, बैंगणी, अशा मळखाऊ रंगांची लुगडी, व पांढरे किंवा चिटाचे पोलके असा असे व लहान मुलींचा खणाचे किंवा चिटाच परकरपोलके असा असे. कोकणात तर रत्नागिरीसारख्या शहरांतसुद्धा मुली क्वचित शाळेत जात व मुले चांगली मोठी होईपर्यंत लंगोटी व सदरा यांखेरीज, शाळेत जाताना काही घालत नसत.

{{gap}}घरी वडील माणसांचा पोषाखही अगदी साधा असे. परीटघडीचे कपडे त्या वेळी माहीतच नव्हते म्हटले तरी चालेल. हल्ली खादी पांघरणाऱ्या माणसाला सुद्धा परीटघडीचे स्वच्छ पांढरे कपडे घातल्यामुळे जी ऐट येते ती त्या वेळी भलेमोठे रेशमीकाठी धोतरवाल्यालासुद्धा नसे.

{{gap}}'''सिनेमा मासिकांनी लावलेले वळण'''

{{gap}}हल्ली सर्वच राहणी बदलली आहे. घरात बाहेर पूर्वी कधी पाहिल्या नाहीत त्या गोष्टी दिसत आहेत. मागच्या पिढीचा पांढरपेशा वर्ग पूर्वीच्या गरिबीतून चांगलाच वर आल्यामुळे त्यांची मुले सुखवस्तू घरातून नांदू लागली आहेत. त्यांची राहणी पूर्वीसारखी कशी असणार? पूर्वी शिक्षणाचे फळ म्हणजे चांगली नोकरी मिळे किंवा तिची आशा सोडली तर समाजात राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रातं चटदिशी पुढारीपण मिळत असे. हल्ली पैसा व मान या दोन्ही गोष्टींनी बी.ए. डिग्रीपर्यंतचे शिक्षणाला अतिशय कमी किंमत आहे. व वरचे शिक्षण घेण्याची ऐपत, पात्रता व स्वास्थ्य थोड्यांनाच आहे. त्या काळी शाळा-कॉलेजांतील शिक्षण एवढाच एक उन्नतीचा मार्ग लोकांपुढे होता. आता हळूहळू दुसरे मार्ग उत्पन्न होऊ लागले आहेत. पण त्यावर जाण्यास लोकांची मने तयार नाहीत. पूर्वी पांढरपेशा वर्गातून शिक्षणाला अतिशय मान असे. शाळेच्या मास्तराबद्दल तुच्छ उद्गार सहसा ऐकू येत नसत. हल्ली पुढारी म्हणविणारे लोकच वेळी अवेळी सकारण अकारण शिक्षणाबद्दल अतिशय अनुदार उदगार काढतात. पूर्वी मुलगा नापास झाला तर आईबाप हळहळत असत. हल्ली मुलाच्या तिमाही सहामाही किंवा आठवड्याच्या परीक्षांचे वृत्तांत कळवूनसुद्धा त्याची दखल घेणारे आईबाप मिळत नाहीत. आपला मुलगा किंवा मुलगी<noinclude></noinclude>
8iwfq935u2m550pj2mgvjvlfvys20h4
पान:आमची संस्कृती.pdf/144
104
21523
237129
138716
2026-09-19T11:36:22Z
कल्पनाशक्ती
3813
237129
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १३७}}</noinclude>शाळेत किंवा कॉलेजात नेमाने जातात का? दिवसाचा किती वेळ अभ्यासात घालवतात? ती कोणत्या विषयात कच्ची आहेत? या साध्या गोष्टींकडे लक्ष पुरविणारे आईबाप किती आहेत? कर्तव्यतत्परतेचे धडे घरी किंवा बाहेर किती प्रमाणात मिळतात?

{{gap}}'''मुख्य शिक्षण, अव्याहत मुलांचे हवे'''

{{gap}}पूर्वी मुलींना शिक्षण म्हणजे मोठा लाभ वाटत असे. कॉलेजातील शिक्षण तर वडील माणसांशी भांडून भांडून मिळवलेले असे. इतरांना नाही असे काहीतरी आपल्याला मिळाले आहे व त्याचे चीज करून दाखविले पाहिजे, ही जाणीव घरची मंडळी व समाज यांजकडून सारखी मिळत असे. आता मुलींना मुलांच्या बरोबरीने शाळेत घालतात. त्यात काही विशेष असे आपल्याला मिळते असे त्यांना वाटले नाही तर त्यात काही नवल नाही. 'प्रत्येकीने शाळेत गेलेच पाहिले का गं!' असे विचारणाऱ्या काही मुलीही मी पाहिल्या आहेत.

{{gap}}मुलींच्या वागणुकीतही फरक पडला आहे. मुलीचा पाय वाजता कामा नये, हसताना आवाज ऐकू येता कामा नये, रस्त्याने जाताना उजव्या भुजेवरील पदर ढळता कामा नये, असे कितीतरी नियम होते. असे हल्लीचे वागणे नाही. त्यावरून हल्लीच्या मुली मर्यादशील नाहीत असे म्हणता येईल का? मुसलमानी मुलखात स्त्रियांच्या शरीराचे कोणतेही भाग दिसत नाहीत म्हणून त्या स्त्रिया जास्त मर्यादशील असे म्हणता येईल का? बाह्य वागणुकीच्या तऱ्हा, देशकालसापेक्ष असतात. केवळ पूर्वीची तऱ्हा आज नाही यावरून मर्यादा कमी झाली, असे म्हणता येत नाही.

{{gap}}बिनबाह्याचे पोलके, कापलेले केस, तोंडाला थोडीबहुत पावडर अशी वेषभूषा व केशभूषा देशांतील सर्वमान्य स्त्रिया- उदाहरणार्थ विजयालक्ष्मी पंडित- करतात. त्या स्त्रियांनी देशासाठी त्याग केला नाही असे कोणी म्हणेल का? त्यांचे अनुकरण इतरांनी केले तर नवल काय? कोणी म्हणेल, बाह्य स्वरूपाच्या सजावटीत अनुकरण होते, इतर गोष्टींत होत नाही. पण हा सर्वसाधारण नियमच आहे.

{{gap}}मुलामुलींच्या आयुष्यात आणखी काही गोष्टी या काळात प्रामुख्याने वळण लावणाऱ्या असतात. त्या म्हणजे सिनेमा व दर महिन्याला निघणारी<noinclude></noinclude>
8odfpjllzhdwa2i7jsd8x97zesmw2j0
पान:आमची संस्कृती.pdf/145
104
21524
237130
138717
2026-09-19T11:48:05Z
कल्पनाशक्ती
3813
237130
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१३८ / आमची संस्कृती
</noinclude>मासिके. या दोहोंतही अभिजात कलेचा व वाङ्मयाचा आविष्कार फारच थोडा असतो. उत्तान शृंगार, उथळ प्रणय व पोरकट संवाद हेच बहुतांशी आढळतात. या सर्वांचे अनुकरण मुले करीत असतात. त्यांच्या वागण्यावरून ती जितकी वाहवत गेली आहेत असे वाटते, तितकी ती सुदैवाने नसतात. हल्लीच्या पिढीत जर काही कमी पडत असेल तर ते हाताने करावयाचे काम. शहरात तर मुलगे काय व मुली काय शारीरिक कष्टाचे काम करीत नाहीत किंवा त्यांना तसले काम पडत नाही. त्यांचे आईबापही असली कामे सहसा करीत नाहीत. भांडी घासण्याला व कपडे धुण्याला बाई असते. दळणकांडण घरी नसते. घरोघर नळ असल्यामुळे विहिरीतून पाणी ओढावे लागत नाही. त्यामुळे बायकांचे शारीरिक कष्टाचे काम कमी झाले आहे. पांढरपेशा पुरुष तर ऑफिसात बसूनच काम करतो. घरीही कष्टाचे काम काही नसते. मित्रमंडळीत गप्पा पत्ते, करमणुकीचे वाचन, क्वचित भाजी आणणे हेच बहुतेक पुरुषांचे जीवन असते. काही देशभक्त इतर कष्टाची कामे करतात, पण त्या कामांचा त्यांच्या स्वतःच्या जीवनाशी व कुटुंबांशी कार्यकारणसंबंध नसतो. दिवसभर डोक्याचे काम करण्याइतकी तयारी नसते व वेळ जाण्यास दुसरे साधन नसल्यामुळे निष्फळ वाचन मात्र बरेचसे होते. शाळेतूनही घरी करण्यासाठी अभ्यास देण्याची प्रथा मोडत चालली आहे असे वाटते. जे करण्यास कष्ट पडतात, असे काही न करता लघुकथा वाचण्याकडेच प्रवृत्ती जाते किवा संध्याकाळी सिनेमा बघावासा वाटतो. फारच झाले तर रेडिओ घरी असला तर तो लावून त्याच्यापुढे बसावयाचे. हल्लीच्या करमणुकीच्या प्रकारात केवळ प्रेक्षकांच्या भूमिकेवरूनच करमणूक करून घ्यावयाची असते. ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या मुक्त पुरुषाप्रमाणे कर्मेंद्रिये सर्वथा स्वस्थ असतात. हात हालचाल करीत नाहीत. पाय आसनस्थ असतात. ज्ञानेंद्रिये व मन स्वस्थ नसते. स्वतः कुस्ती खेळणारे दहा तर बघे हजार. क्रिकेट खेळणारे बावीस तर बघणारे, वाचणारे व रेडिओवरून ऐकणारे दहा हजार, असा प्रकार असतो. दर वर्तमानपत्रात आंतरप्रांतीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटूच्या खेळांच्या बातम्या, वर्णन व फोटो देणारे एक तरी सदर असतेच. सिनेमात दिसणारी गोड सृष्टी, स्वानुभवाने थोड्यांच्याच वाट्यास येते. पण पाहता पाहता आपल्याला नायक व<noinclude></noinclude>
g0mek7p5db53o7cdry12quzyjk34a6y
पान:आमची संस्कृती.pdf/146
104
21525
237131
138718
2026-09-19T11:53:05Z
कल्पनाशक्ती
3813
237131
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />{{right|आमची संस्कृती / १३९}}</noinclude>नायिकेच्या जागी कल्पून घेता येते. या क्रियाहीन करमणुकीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे तीमुळे करमणूक होत राहण्यास ती जास्त जास्त भडक असावी लागते. स्वतः चालले, कुस्ती खेळले, पोहले म्हणजे मनुष्य दमतोच. मनुष्याची कामवासना कितीही तीव्र असली तरी तीही काही मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही. पण क्रियाहीन करमणुकीच्या प्रकारांत इंद्रिये दमण्याचा प्रश्नच नसतो. तेच तेच पाहून बेचव वाटू लागते. म्हणून शृंगार जास्त जास्त उत्तान, विनोद जास्त जास्त बोचक, हाणामारी जास्त जास्त भयंकर करावी लागते. इतके सगळेही करून सिनेमा जिवंत राहण्याची खात्री न पटल्यामुळे हल्ली प्रचंड मोठ्या पडद्यावर, वास्तवापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणावर व सृष्टीतील घनता व खोली दाखवता येईल अशा तऱ्हेचे चित्रपट दाखवितात. या चित्रपटात गोष्ट, भावनांचे आविष्करण वा प्रसंगांचे चित्रण यांपैकी कशांतही हळुवारपणा, कौशल्य, सूक्ष्म व सूचक स्वभावरेखन, ध्वनित केलेल्या छटा यांपैकी काहीही नसते. सर्व प्रसंग असे निवडलेले असतात की, त्यांत भयानक समरप्रसंग व स्त्रीच्या उघड्या अंगाचे जास्तीत जास्त प्रदर्शन व्हावे. हल्लीच्या युगात स्त्रीच्या अंगप्रत्यंगाचे जेवढी बाजारी प्रदर्शन चालते तसे पूर्वी कधीही नव्हते.

{{gap}}अशा परिस्थितीत व्यायाम, खेळ, शारीरिक कष्ट यांची गरज पूर्वीपेक्षा जास्त आहे. एका बाजूला गरिबी, तर दुसऱ्या बाजूला पूर्वी पाहिली नाही अशी चैन दिसते. त्यांपैकी काही चैन पैशाने स्वस्तात पडते. पण मुलांना घातक ठरते. अशा परिस्थितीत मुलांपेक्षा मोठ्या माणसांचीच जबाबदारी वाढलेली आहे. आई, बाप, शिक्षक, नगरपालिका, राज्यकर्ते सर्वानीच ही जबाबदारी ओळखून मुलांना राहावयास योग्य असे जग निर्माण केले पाहिजे. वागणुकीच्या बाह्य स्वरूपात कालमानाप्रमाणे फरक पडेल, पण काही मर्यादा सर्वकालीन असतात. धर्म, अर्थ, काम हे साधताना 'नातिचरामि' हे ब्रीदवाक्य सर्वांनी ध्यानात बाळगले पाहिजे. माझा अर्थकाम साधताना, इतरांना न दुखवता, इतरांचे हरण न करता मी तो साधीन हे मुलांना व मोठ्यांना सगळ्यांनाच कळले पाहिजे. रस्त्यात जाताना इतर चालत आहेत व वाहने धावत आहेत, रस्ता सोयीने वापरला तर सगळ्यांना सुख होईल, बसमधून जाताना जोरजोराने हसून बोलून<noinclude></noinclude>
95czvjgadgvzgdcnh1nwovi912vmebu
पान:आमची संस्कृती.pdf/147
104
21526
237132
138719
2026-09-19T11:55:00Z
कल्पनाशक्ती
3813
237132
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="रेश्मा जाधव" />१४० / आमची संस्कृती
</noinclude>उत्तानपणे वागून आपण इतरांना घृणा उत्पन्न करीत आहोत, इतकी की, बिचारा कंडक्टरसुद्धा या कॉलेज मुला-मुलींमध्ये चाललेल्या प्रकाराला कंटाळून गेला आहे, हे लक्षात आल्यास तसे वागणे होणार नाही. या लहानसहान गोष्टींचा अपहार व मोठ्या सामाजिक आयुष्यात मोठा अपहार, मोठेपणाची तृष्णा व सदैव असंतुष्टता या सर्वांनाच आळा बसेल. निःस्वार्थी, त्यागी स्त्री-पुरुष आजही समाजात आहेत, पण त्यांच्या उदाहरणाने भागत नाही. समाजाची मूल्ये काय व ती कशी आत्मसात करावी याचे अव्याहत शिक्षण मुलांना मिळाले पाहिजे.

{{right|- १९५५}}
{{nop}}<noinclude></noinclude>
3cti7ar8dkvp0hjc89is7wy0w36lp6f
शंकराची आरती/भस्मप्रिया भूतपते सदय
0
108390
237096
223537
2026-09-18T15:44:52Z
~2026-50487-35
6234
237096
wikitext
text/x-wiki
भस्म प्रिया भूतपते सदय शंकरा ।
पंचारती करितो तुज हे माहेश्वरा ।। धृ ।।
त्रिविध ताप दूर करी तारी किंकरा ।
आरती मी करितो तुज हे महेश्वरा ।। १ ।।
कृपार्णवा सदाशिवा तू उमावरा ।
विठ्ठलात्मजाचे पदी देई आसरा ।। २ ।।
8es9ofcxblg1eojmhdtom9s3i6yq2me