विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.21
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/16
104
29125
237399
136431
2026-09-24T11:26:19Z
JayashreeVI
4058
/* प्रमाणित */
237399
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="JayashreeVI" /></noinclude>आशयसूत्र अभिव्यक्त झाले आहे.कादंबरीत या दोन अनुभवसूत्रांच्या ताणांतून त्यास आकार प्राप्त झाला आहे.लेखकाने या कादंबरी रचितामध्ये एक मुख्य विचारसूत्र गृहीत धरलेले आहे.गेल्या तीस चाळीस वर्षात प्रशासनात भ्रष्टाचाराने प्रचंड थैमान घातले आहे.भ्रष्टाचारानं चहूबाजू व्यापणे हे लोकशाही कल्याणकारी व्यवस्थेला बाधा आणते आहे.संवेदनशील अधिका-यांची या व्यवस्थेत प्रचंड घुसमट होते आहे.या कादंबरी शीर्षकात ‘ऑक्टोपस' हे एक रूपक योजिले आहे.ऑक्टोपस-समुद्रजीवांचे भक्ष्य सापडताच तो त्याला चहूबाजूंनी वेढून टाकते.ऑक्टोपस बाह्यरूपाने नाजूक आणि मृदू दिसतो.मात्र आपले भक्ष्य पायांनी पकडून तो त्या जीवाला गिळंकृत करतो.तद्वत भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना भ्रष्टाचाराचे हे जग वरून मोहक वाटते.मात्र आतून त्याची सर्वव्यापक गिळंकृतता लक्षात येत नाही.तसेच या भ्रष्टाचाररूपी ऑक्टोपसने भारतीय समाजाला चहूबाजूने वेढून टाकले आहे.या मूल्यभानाचा आविष्कार ही कादंबरी करते.

{{gap}}या विचारसूत्राचा आविष्कार करण्यासाठी लेखकाने प्रशासनातले हे जग सरळ दोन रंगात न्याहाळले आहे.आपल्या म्हणण्याच्या प्रतिपादनासाठी काळ्या आणि पांढ-या रंगात त्या जगाची निर्मिती केली आहे.कादंबरी संरचनेतील कथासृष्टीपासून ते पात्रे,घटना,प्रसंग यावर निवेदकाने कल्पिलेल्या मूल्यभावाचा गडद प्रभाव आहे.एका आदर्शवादी भूमिकेतून या सा-या कथासृष्टीकडे पाहिले गेले आहे.या आदर्शवादी भूमिकेचा वारंवार उच्चार कादंबरीभर आहे.उपभोगतावादी मूल्य-हासाच्या राजकारणाची व प्रशासनातील संगनमताच्या जुटीची ही कहाणी आहे.आजच्या भ्रष्टाचारी काळाचा युगधर्मच यातून सांगितला गेला आहे.या कादंबरीत या भ्रष्टाचारी जगाच्या चित्रणांबरोबर कुटुंबजीवनातील व प्रशासनातील अनेक ताण आहेत.तरुण मुलांच्या शिक्षणाचे व त्यांच्या करिअरचे जग आहे.यात तडजोडवादी भूमिकांचे चित्रण आहे.भगवान काकडे आपल्या मुलाच्या वैद्यकीय शिक्षणासाठी व त्यासाठी द्याव्या लागणाच्या डोनेशनसाठी तो पालकमंत्र्याशी तडजोड करतो. नोकरीत गैरमार्गाने मिळणाच्या पैशाची जागा पत्करतो.

{{gap}}सिनेमॅटिक वर्णनाच्या अंगाने या कादंबरीचे रूप घडले आहे.विशेषत: भगवान काकडेची कथा ही या कादंबरीत महत्त्वाचा संदर्भबिंदू आहे.त्याच्या या काळातील आयुष्यक्रमात ज्या घटना घडतात त्या योगायोगाच्या व आकस्मिक नाट्य निर्माण करणा-या आहेत.त्याची पत्नी भ्रष्टाचाराचा आरोप आल्यामुळे भगवान काकडेला सोडून निघून जाते.तेही ज्याने भगवानला या प्रकरणात गुंतवले त्याच्याकडे.तो उस्मानाबादला येतो त्यावेळी त्याला आधार देते ती रुक्मी.त्याच्या गावातीलच आयुष्यातील दुर्दैवी घटनेमुळे वेश्या म्हणून जगत असलेली.भगवानचा मुलगा आनंद हुशार,दहावीला पहिला नंबर आलेला.रस्त्यात एका गाडीकडून त्याला अपघात.<noinclude>{{right|'''लक्षदीप ॥ १५'''}}</noinclude>
oepiirv2xbwbh8z3w75y1psgbchoe1r
पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/17
104
29126
237400
136432
2026-09-24T11:33:26Z
JayashreeVI
4058
/* प्रमाणित */
237400
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="JayashreeVI" /></noinclude>गाडीत त्याची पूर्वीची आई असणे, तिच्यातला वात्सल्यभाव जागृत होणे आणि त्याचे तिला परतवून लावणे अशा अनेक योगायोगाच्या घटना कादंबरीत घडतात.तसेच कादंबरीतील घटना, प्रसंगांना फार वेग आहे,गती आहे.या कादंबरीत घटनाप्रसंगातील धावती दृश्यमिती मोठ्या प्रमाणात आहे.एकूणच भ्रष्टाचाररूपी प्रशासनातील व्यवस्थेचा पट या कादंबरीतून साकार झाला आहे.तडजोडवादी भ्रष्ट व्यवस्थेचा विजय यात होतो.भ्रष्टाचाररूपी किडलेल्या व्यवस्थेला शरणागती पत्करणाच्या समूहजाणिवेचा आविष्कार या कादंबरीत आहे.तसेच आनंद पाटलाच्या कृतीतून नव्या पर्यायाचा शोधही आहे.

{{gap}}‘अंधेरनगरी' (१९९४) ही त्यांची दुसरी कादंबरी.राजकारण व प्रशासनातील एका वेगळ्या पैलूवर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे.नगरपालिकेच्या सत्ताकेंद्राच्या प्राप्तीचा संघर्ष या कादंबरीत आहे.सर्वत-हेच्या कपटनीतीचा अवलंब सत्तासोपानासाठी कसा केला जातो त्याचे तीव्रतर चित्रण या कादंबरीत आहे.राजकारणातील सूक्ष्म तपशीलातून सत्तासंघर्षाचे विश्व या कादंबरीतून साकार झाले आहे.

{{gap}}स्वातंत्र्यानंतरच्या तीनेक दशकात जे ध्येयवादाचे,साधनशुचितेचे राजकारण,समाजकारण धुळीला मिळाले आहे.त्याची जागा आता केवळ स्वार्थप्रेरित राजकारणाने घेतली आहे.कादंबरीची सबंध सूत्र हे नगराध्यक्षपदाच्या सत्ताकेंद्रावर खिळलेले आहे.त्याच्या भोवतीचे विविध सूत्रे समांतरपणे व्यक्त होतात.मात्र अंतिमतः ते सत्तेच्या खुर्चीभोवती पिंगा घालून तिथेच विराम पावतात.सत्ताप्राप्तीसाठी साम,दाम,दंड, भेद या नीतीचा अवलंब केला जातो.उद्या पुन्हा हाच खेळ याप्रमाणे पुन्हा एकदा राजकारणाचा नवा खेळ आकाराला येतो.त्या कपटनीतीच्या अंधेरनगरीचा शोध या कादंबरीत आहे.नगरपालिकेतील सत्तासंघर्षाला किती विविध त-हेचे कंगोरे असतात याची प्रचिती या कथनसूत्रात आहे.राजकीय गणिते,समाजकारण, जातकारण,प्रदेश अस्मिता ते सूडनाट्याची व्यूहरचना या कादंबरीत आहेत.वरवर हा लालाणी व पाटील यांच्यातील सत्तासंघर्ष दिसत असला तरी यामध्ये अनेक घटक सक्रीय असतात.समान हितसंबंधाचे धागे गुंतलेले असतात.सत्ताप्राप्तीच्या आंतरिक वास्तवाचा वेध या कादंबरीत आहे.

{{gap}}Everything is fair in love, war and politics या विचारसूत्राचा आविष्कार या कादंबरीत आहे.राजकारण माणसाला निघृण व कठोर बनविते या जाणिवेचा आविष्कार कादंबरीतून घडला आहे.या कादंबरीचा लक्षणीय विशेष म्हणजे नगराध्यक्षपदाचे सत्तापद केंद्रस्थानी ठेवून त्याच्या प्राप्तीचे राज्यकर्त्यांमध्ये चाललेले विविध मार्ग ध्वनित झाले आहेत.राजकीय जाणिवांचे फार बारकाईचे संदर्भ या कादंबरीत आहेत.यासाठी अनेक पात्रांची निर्मिती केली आहे.ही पात्रे या सत्तासंघर्ष नाट्यात विविध भूमिका बजावतात.सहभागी होतात.राजकीय चर्चित विश्वाचा भाग त्यामध्ये आहे.<noinclude>{{left|'''१६ । लक्षदीप'''}}</noinclude>
ns7vi98fl7pmt085zzpatx74qhdp0jx
पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/18
104
29127
237401
136433
2026-09-24T11:48:38Z
JayashreeVI
4058
/* प्रमाणित */
237401
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="JayashreeVI" /></noinclude>तीन वर्षाच्या राजकीय कार्यकाळाचे त्यातील घडमोडीचे वेगवान चित्रांकन या कादंबरीत आहे.

{{gap}}‘इन्किलाब विरुद्ध जिहाद' (२००४) ही लक्ष्मीकांत देशमुख यांची वेगळ्या विषयावरची कादंबरी.मराठीत दीर्घ अशा कालावकाशाचे चित्रण असणा-या कादंब-या फारशा नाहीत.वास्तविक कादंबरीसारख्या साहित्यप्रकारात मानवी जीवनाचे त्याच्या दीर्घ अशा कालावकाशाचे चित्रण करण्यास फार मोठा अवसर असतो.मात्र अशा दीर्घ पल्ल्याच्या कादंबच्या मराठीत फारशा नाहीत.'इन्किलाब विरुद्ध जिहाद' या जवळपास साडेनऊशे पृष्ठांच्या कादंबरीत प्रदीर्घ अशा अफगाणिस्थानमधील धर्मयुद्धाचे चित्रणआले आहे.अफगाणिस्थानमधील विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील अर्धशतकाचा पट तीमधून चित्रित झाला आहे.भारतालगत वसलेल्या अफगाणिस्थानातील पन्नास वर्षाची राजकीय वाटचाल या कादंबरीत आहे.विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या आंतरराष्ट्रीय दहशतवादाने अधिक भयावह रूप धारण केले आहे त्या वास्तवाचे मराठी कादंबरीत प्रथमत:च आंतरराष्ट्रीय राजकारणाचे,तेथील सत्तासंघर्षाचे,बदलत्या समाजजीवनाचे व राजकारणाचे चित्र अभिव्यक्त झाले आहे.

{{gap}}कादंबरीतला प्रमुख संघर्ष आहे तो क्रांती विरुद्ध धर्मयुद्ध यांच्यातील.विशिष्ट प्रदेशातील सामूहिक मनाला व जीवनरीतीला विशिष्ट आकार प्राप्त झालेले असतात.अफगाणिस्थानात समूहजीवनावर व संस्कृतीवर धर्मभावनेचा मोठा प्रभाव आहे.आधुनिकीकरणाच्या एका टप्प्यावर अफगाणमधील बदलाला सामोरे जाताना मुळातल्या जिहादचा उद्रेक होतो आणि वणव्याप्रमाणे तो सर्वत्र पसरतो.या राष्ट्राचा काही काळ सोव्हियत युनियनशी संबंध येतो आणि मार्क्सवादी आधुनिकतावादी राजकीय विचारसरणीशी अफगाणमधील लोकांचा संबंध येतो.ही विचारसरणी रुजताना मूळच्या परंपरेतील मूळ आकारांना तडे बसतात.ते दुभंग होतात.मात्र चिवट अशा धर्मप्रेरणेमुळे ही सर्व माणसे धर्मसंस्काराला जवळ करतात व जिहादच्या वाटेने राज्यसंस्थेला आपलेसे करतात.

{{gap}}या कादंबरीतील जीवनचित्रणास बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संदर्भ आहे. अफगाणिस्थानातील समूहदर्शन आहे.संस्कृतिचित्रण आहे.कौटुंबिक स्थितीची वर्णने आहेत. लोभस आणि मोहक निसर्ग आहे.परंपरा आणि आधुनिकता यातील संघर्ष आहे.स्त्रियांच्या हालाखीच्या दु:खभ-या करुण कहाण्या आहेत.

{{gap}}या प्रकारच्या जीवनचित्रणासाठी देशमुख यांनी अनेकविध पात्रांची निर्मिती केली आहे.मुस्लीम पुश्तू कुटुंबातील समाजदर्शन तीमध्ये आहे.एकाच वेळी वास्तव आणि कल्पित यांच्यातील बेमालूम मिश्रण या कादंबरीत आहे.ही कादंबरी त्यांनी मोठ्या कष्टपूर्वक व व्यासंगपूर्वक रीतीने लिहिली आहे.विशेषत: दहशतवादासारख्या संवेदनशील विषयावर लिहिणे ही अवघड अशी बाब असते आणि तो विषय जबाबदारीच्या<noinclude>{{right|'''लक्षदीप ॥ १७'''}}</noinclude>
d528276rwempnsr7znr08121vy822sj
पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/19
104
29128
237402
136435
2026-09-24T11:58:28Z
JayashreeVI
4058
/* प्रमाणित */
237402
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="4" user="JayashreeVI" /></noinclude>भानातूनही लिहिला गेला पाहिजे. अशा प्रसंगी लेखकावर बाहेरचे अनेक दाब असतात. जवळपास आठेक वर्षाच्या कष्टसाध्य व्यासंगाने ही कादंबरी आकाराला आलेली आहे.यासाठी त्यांनी इतिहास, धर्मशास्त्र,संस्कृती व समकालीन घडामोडींवरील विपुल संदर्भसाधने वापरली आहेत.विशेषत: या कादंबरीत अफगाणिस्थानातील समूहदर्शन आणि तेथील जीवनरीतीचे फार बारकाईने चित्रण आले आहे. एका अपरिचित अशा मुस्लीम जगाला सजीव करण्यासाठी लेखकाने फार मेहनत घेतलेली आहे.एका विशिष्ट संस्कृतीच्या जीवनचित्रणासाठी धर्म व संस्कृतीचा मोठा पट उभा केला आहे. तेथील वातावरण निर्मितीसाठी व समूहदर्शनासाठी उर्दू-फारसी-पुश्तू भाषाचिन्हांचा मोठा वापर यामध्ये आहे.ओघवत्या व प्रवाही अशा गद्यलयीत कादंबरीतील कथन पुढे सरकते.एक धगधगता राजकीय दहशतवादाचा इतिहास इथे जिवंत केला आहे.

{{gap}}एकूणच लक्ष्मीकांत देशमुख यांचे कादंबरीविश्व हे विविधस्वरूपी आहे.तीमधून नवी आशयसूत्रे प्रकटली आहेत.प्रशासन जीवनातील जीवनचित्रण व राजकीय जाणिवांचे चित्रण ही त्यांच्या कादंब-यांची महत्त्वाची उपलब्धी आहे.स्वतːच्या मूल्यविषयक धारणेतून या कादंबरीतील जाणीवसूत्रे आकाराला आली आहेत.तसेच इन्किलाब विरुद्ध जिहाद' या सुदीर्घ अशा बृहद कादंबरीत आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा हाताळलेला विषय हा मराठी कादंबरीला नवा आहे.

{{center|'''५.'''}}
{{gap}}देशमुख यांची दोन नाटके प्रकाशित आहेत.दूरदर्शन हाजीर हो' हे देशमुखांचे १९९९ साली प्रकाशित झालेले बालनाट्य,समकाळातील एका भेडसावणाच्या प्रश्नाधारित हे नाटक आहे.लहान मुले इडियट बॉक्स नामक टी.व्ही.च्या आहारी गेल्यामुळे किती गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले आहेत ते या नाटकातून सांगितले आहे.मराठवाड्यातील सेलू गावात या नाटकाचे कथानक घडते.या शतकातल्या लहान मुलांच्या जीवनातील टी.व्ही.रूपी सर्वात मोठ्या शत्रूने कसा धुमाकूळ घातला आहे.त्यासाठी नाटकात एक अभिनव अभिरूप न्यायालयात टी.व्ही. विरोधात खटला चालू ठेवला.तमाशातील बादशाह व दिवाणजी वकिलांची भूमिका धारण करून हा प्रश्न चर्चिला आहे.टी.व्ही. व सिनेमांच्या आहारी गेलेल्या मुलांची व त्यांच्या पालकांची मानसिकता,त्याचबरोबर समांतर काही अल्पशी मुले ज्ञान मनारंजनासाठी आवश्यक तेवढा टी.व्ही. पाहणारी मुले आहेत.सर्वांनी एकत्र येऊन संस्कारक्षम तरुण पिढी घडविण्यासाठी एकसूत्री काम करायला हवे असा संदेश दिला आहे.एका आदर्शवादी भूमिकेतून या प्रश्नाकडे या नाटकाद्वारे पाहिले आहे.

{{gap}}देशमुख यांचे ‘अखेरची रात्र' हे नाटक २०१४ साली प्रकाशित झाले.दोन अका या नाटकात पडद्यावरील एका कलावंताची शोकात्मकथा सांगितली आहे.<noinclude>{{left|'''१८ । लक्षदीप'''}}</noinclude>
p1zd5bhhk7qr9qukhyroyt0evxpisc0