विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.21
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:छन्दोरचना.djvu/52
104
5768
237493
237492
2026-09-28T11:59:03Z
कल्पनाशक्ती
3813
237493
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''२५'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>वाढवून तें अष्टमात्रक तरी करून घेतलें पाहिजे अथवा तेवढा भाग म्हणतांना ठेका बन्द तरी ठेवायला पाहिजे.
{{Block center|<poem>{{gap}}"तुजवीण सखे, मज कोणि नसे;
{{gap}}प्रतिमाहि तुझीच हृदीं विलसे.{{gap}}ध्रु०
मी करीं पूजा तियेची भावपुष्पे वाहुनी,
आणि पुष्पे कोणती पूजेस अुञ्ची यांहुनी?
{{gap}}{{gap}}परि ती न कधीच बघे हसुनी
{{gap}}भिजवी न कधी मन शान्तिरसें. १ (ग १०४)</poem>}}
{{gap}}वृत्त वृत्तांचें वा वृत्त-जातींचें मिश्रण घोटाळा अत्पन्न करीत नाही; कारण, अक्षरें जशी लिहिलेली असतात तशींच वाचायची असतात. वृत्त आणि जाति दोन्हींतहि लगभेद आहे. परन्तु वृत्त आणि छन्द, वा जाति आणि छन्द यांचे मिश्रण युक्त नाही; कारण अेक भाग वाचतांना लगभेदाकडे लक्ष्य द्यावें लागतें तर दुसरा भाग वाचतांना, लिखित लघु असो वा गुरु असो प्रत्येक अक्षर गुरूच अुच्चारायचें असतें. म्हणून कारेकृत 'मेघाचें अश्रुगीत' या कवितेतील
{{Block center|<poem>“येसि कधी घेअुनि ज्योत्स्ने, किरणपुष्पमाला?
तिमिर भावरङ्ग पुसाया अन्तरीं रिघाला{{gap}}ध्रु.
{{gap}}तरङ्गतां वाऱ्यावरी
{{gap}}चमकुनी परोपरी
{{gap}}सोनसळी जादू करी
क्रूर वञ्चनेंत परन्तु अन्ति लोटण्याला." (नदी ९५)</poem>}}
ध्रुवपद जातिस्वरूप, कडव्याचे पहिले तीन चरण छन्दःस्वरूप म्हणजे लगभेदातीत, आणि चौथा चरण पुन्हा जातिस्वरूप हें मिश्रण घोटाळा अुत्पन्न करणारे असल्याने अिष्ट नाही. 'येसि कधी घेअुनि' मधील क लघु अुच्चारायचा आणि 'सोनसळी जादू करी' मधील क गुरु अुच्चारायचा ही विसङ्गति अेकाच कवितेंत अिष्ट नाही. शुद्ध छन्द वा शुद्ध जाति यांच्या रचनेंत कवीला विविधता आणि मोकळीक हीं हवींत तितकी मिळू शकतात.{{nop}}<noinclude></noinclude>
pbgqvvvcu7u0k0qra7byfbegelrtkd7
पान:छन्दोरचना.djvu/53
104
5769
237494
15556
2026-09-28T12:16:43Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237494
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''२६'''|}}</noinclude>{{gap}}अिन्द्रवज्रा-अुपेन्द्रवज्रा वा अिन्द्रवंशा-वंशस्थ यांच्या स्वैरमिश्रणांत स्वाभाविकपणा आहे. दोन वृत्तांच्या मिश्रणाचे सहजगत्या पडणारे चार प्रकार मागे साङ्गितलेच. परन्तु भेदैकदृक्, प्रस्तारप्रिय आणि परिभाषावर्धनेच्छु छन्दःशास्त्रकारांनी याचे जितके प्रकार होणें शक्य आहे तितके म्हणजे चौदा कल्पिले असून, अिन्द्रवज्रा-अुपेन्द्रवज्राच्या अुपजातिप्रकारांना चौदा आणि अिन्द्रवंशा-वंशस्थाच्या अुपजातिप्रकारांना चौदा मिळून अठ्ठावीस<ref>यांपैकी अिन्द्रवज्रा- अुपेन्द्रवज्राच्या अुपजातीच्या चौदा प्रकारांचीं नावें पुढील श्लोकांत दिली आहेत. "कित्ती, वाणी, माला, साला । हंसी, माआ, जाआ, बाला | अद्दा, भद्दा, पेम्मा, रामा । रिद्धी, बुद्धी, तासू णामा" (प्रापै २/१२१). अिन्द्रवंशा-वंशस्थाच्या चौदा अुपजातिप्रकाराचीं नावें काशीसंस्कृतमालेतील वृत्तरत्नाकराच्या आवृत्तीचे सम्पादक वैद्यनाथशास्त्री वर्कल यांनी ७९ व्या पृष्ठावर टीपेंत दिली आहेत; पण आधार दिला नाही. शिशिरा हे नाव त्यांनी दिलें आहे.</ref> संज्ञा दिल्या आहेत! परन्तु आख्यानकी, विपरीताख्यानकी नि शिशिरा या तीन अर्धसमवृत्तरूप अुपजातींतच सहेतुकपणें दीर्घ रचना केलेली आढळते. अितर प्रकारांपैकी कित्येकांची अुदाहरणे सुद्धा मिळत नाहीत.
{{gap}}राजानकरत्नाकरकृत हरविजयम् या संस्कृतकाव्याच्या सत्ताविसाव्या सर्गात श्लोक मिश्रणाचा अेक विशिष्टक्रम आढळतो. पुष्पिताग्राचा अेक श्लोक, मग अुपजातीचा अेक श्लोक आणि मग वसन्ततिलकाचे दोन श्लोक या क्रमाने चारचार श्लोकांचे गट केलेले दिसतात.

{{center|'''१८ पद्यांतील टुमी'''}}
{{gap}}काव्यांत कोणत्याहि काळी काही पद्यप्रकार रूढ झालेले असतात तर काही पद्यप्रकार प्रयोगावस्थेत असतात. काही प्रकार मागे पडणें, काही रूढ होणें आणि काही प्रयोगावस्थेतच मान्यतेसाठी पुढे येत रहाणें हें भाषेच्या आणि प्रतिभेच्या जिवन्तपणाचेच द्योतक आहे. गेल्या तीस वर्षांचाच अितिहास पाहिला तर दाशरथी, चन्द्रकान्त अित्यादि काही जाति मागे पडल्या; मुद्रिका, नववधू अित्यादि जाति रूढ झाल्या आणि आता स्वैरपद्यादि नवे प्रयोग मान्यतेसाठी झगडत<noinclude>
{{reflist}}</noinclude>
2pcindytf2xwshqzk67k2xolcv0nnse
पान:छन्दोरचना.djvu/54
104
5770
237495
15557
2026-09-28T12:25:39Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237495
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''२७'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>आहेत. पिङ्गलाच्यावेळीही काही प्रकार प्रयोगावस्थेत होते. त्यांना नावें पिङ्गलाने दिली असावीत. त्यांचा समावेश तो गाथाप्रकरणांत<ref>"अत्र शास्त्रे नामोद्देशेन यन्त्रोक्तं छन्दः प्रयोगे च दृश्यते तद्गाथेति मन्तव्यम्" (हपि १५५)</ref> करितो.

{{center|'''१९ मराठींतील पद्यरचनेचा अितिहास'''}}
{{gap}}पद्यरचनेचे छन्द, जाति आणि वृत्त हे जे तीन मुख्य प्रकार आहेत त्या तिन्ही प्रकारची पद्यरचना आजपर्यन्त मराठींत चालू आहे.
{{gap}}'''(१) छन्द.''' – अभङ्ग, ओवी, घनाक्षरी अित्यादि पद्यप्रकारांत लघुगुरु हा भेद नाही. स्थूलमानानें सर्व अक्षरें सारख्याच दीर्घ कालांत म्हणजे गुरूच अुच्चारायची असतात. अर्थात्, या पद्यप्रकारांत मुख्य नियमन अक्षरसङ्ख्येचें दिसतें. प्रत्येक अक्षरांचा काल दोन मात्रांचा असल्यामुळे या पद्यप्रकारांत अष्टमात्रक आणि षण्मात्रक अशा दोनच आवर्तनांची रचना होअू शकते. या लगत्वभेदातीत अक्षरसङ्ख्याक पद्यप्रकाराला काहीतरी पारिभाषिक नाव पाहिजे म्हणून वैदिकपद्यप्रकाराला असणारें '''छन्द''' हें नाव दिले आहे. कोणत्याहि नियमबद्ध पद्यप्रकाराला सामान्यपणें छन्द वा वृत्त म्हणतात, जसें पृथ्वी छन्द, वैतालीय छन्द, गीतिवृत्त अित्यादि परन्तु वृत्तास जसा विशिष्ट पारिभाषिक अर्थ देण्यांत आला आहे तसा छन्द या शब्दास देण्यास प्रत्यवाय नसावा. अलीकडे छन्दांत रचना करण्याकडे कवींचें लक्ष्य अधिकाधिक जाअू लागलें आहे. विशेषतः यवतमाळचे विद्वान् आणि व्यासङ्गी कवि वामन नारायण देशपाण्डे हे सहेतुकपणे छन्दांत विविध रचना करितात.
{{gap}}'''(२) जाति.''' – जातिरचनेंत लगत्वभेद आहे. समरचनेंतहि अक्षरांची सङ्ख्या नि लगक्रम हीं अभिन्न नसतात. तथापि लघुची अेक मात्रा<ref>"मीयते अनया सा मात्रा"
"चाषस्तु वदते मात्रां, द्विमात्रं त्वेव वायसः
शिखी रौति त्रिमात्रं तु नकुलस्तत्वर्धमात्रकम्" (पाणिनीय शिक्षा ४९)</ref> आणि गुरूच्या दोन मात्रा या गणिताने मात्रांची सङ्ख्या सारखी भरते. मात्रांची सङ्ख्या हे अेकच काही या पद्यप्रकाराचें लक्षण नाही. या मात्रासङ्ख्या-<noinclude>
{{reflist}}</noinclude>
4iz6occv267hgckioqqje7neps8s1w0
पान:छन्दोरचना.djvu/55
104
5771
237496
15558
2026-09-28T12:41:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237496
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''२८'''|}}</noinclude>कजातींत अष्टमात्रक, सप्तमात्रक, षण्मात्रक वा पञ्चमात्रक आवर्तनें असतात. या मात्रासङ्ख्याक पद्यप्रकारास मात्रावृत्त वा मात्राच्छन्द म्हणतात; परन्तु वृत्त या शब्दाचा पारिभाषिक निश्चित अर्थ वेगळा असल्याकारणाने या मात्रासङ्ख्याक रचनेस पूर्वीपासून चालत आलेलें '''जाति'''<ref>{{gap}}"पद्यं चतुष्पदं तच्च वृत्तं जातिरिति द्विधा
{{gap}}अेकदेशस्थिता जातिर्वृत्तं लघुगुरुस्थितम्" (हपि ५२)
वा "पद्यं चतुष्पदी तच्च वृत्तं जातिरिति द्विधा
{{gap}}वृत्तमक्षरसङ्ख्यातं जातिर्मात्राकृता भवेत्" (गछ १/४).
{{gap}}वृत्तांचे चरणाक्षरसङ्ख्येप्रमाणे जे अुक्तादि वर्ग कल्पिले आहेत त्यांनाच हेमचन्द्र जाति म्हणतो.</ref> हे नाव स्पष्टपणे निश्चित करावें हें योग्य होय.
{{gap}}ही गेय जातिरचना मूळची प्राकृतांतील असावी. ही संस्कृतांत शङ्कराचार्यांच्या मोहमुद्गर काव्यांत, जयदेवाच्या गीतगोविन्द काव्यांत आणि रूपदेवाच्या स्तवमालेत दिसते. मराठींत प्राचीन कालापासून अेकीकडे प्रौढ वाङ्मय छन्दांत रचिलें जात असतांना, मिराबाअी, सुरदास, कबीर अित्यादि अुत्तर हिन्दुस्थानांतील सन्तगीतकारांच्या अुदाहरणाने मराठींत 'पदें' होअू लागलीं. ही सारी जातिरचना आहे. ज्ञानेश्वराचीं पदें अुपलब्ध नाहीत असें नाही. परन्तु मराठीतील पहिला मोठा पदें लिहिणारा गीतकार अेकनाथ हा होय. याची रचना शिथिल आहे. आ, अे, ओ हे स्वर केव्हा केव्हा लघु अुच्चारावे लागतात तर केव्हा केव्हा अ दीर्घ अुच्चारावा लागतो. पुढे संयुक्त व्यञ्जन (केवळ दृश्य नव्हे तर श्राव्य) आल्यास मागील लघूस निरपवादपणें गुरुत्व यायला हवें तें विकल्पाने येतें, म्हणजे कोठे तें येतें आणि कोठे तें येत नाही. लेखनपद्धति सर्वस्वी अुच्चारानुसारी नसल्यामुळे केवळ लेखानुसारी वाचन करून गीतांतील आन्दोलनाचा पत्ता लागत नाही आणि मग साहजिकपणेंच चाल लागत नाही. या मोठ्या दोषांमुळे प्राचीन पद्यसङ्ग्रहांतील किती तरी पदें पद्यदृष्टया दुर्बोध अतओव निरुपयोगी होऊन बसली आहेत. हें शैथिल्य गोविन्द बल्लाळ देवल यांच्या पदांच्या रचनेपासून म्हणजे आधुनिक काळांतच नष्ट झालें आहे.{{nop}}<noinclude>
{{reflist}}</noinclude>
ta6eeb5b6qla02tb300vq185erk5l8a
पान:छन्दोरचना.djvu/56
104
5772
237497
15559
2026-09-28T12:51:01Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237497
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''२९'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>{{gap}}ही पदें बहुतेक सन्तकवींनी, थोडीं अितर कवींनी लिहिली आहेत. हीं धार्मिक स्वरूपाची असल्यामुळे भाबड्या भाविक समाजाने त्यांचे स्मरण ठेविलें आणि कीर्तनकारांनी तीं कीर्तनांत गाऊन दाखवून त्यांचा प्रसार केला. आनन्दतनय आणि रघुनाथ पण्डित यांनी आपल्या विविध वृत्तांत लिहिलेल्या आख्यानांतून मधून मधून हीं गेय पदें विखुरलीं आहेत. मध्वमुनीश्वर, केशवस्वामी, नरहरि शिष्य वणीकर, देवनाथ, दयाळनाथ अित्यादकांची जातिरचना विपुल आहे. अमृतराय, रामजोशी (कविराय), होनाजी बाळ, सगनभाऊ, प्रभाकर अित्यादि कवींनी कटाव, पोवाडा, लावणी अित्यादि जी गोन्धळी रचना केली ती सारी जातिरूपच आहे आणि ती बहुतेक शिथिल आहे. परन्तु रामजोशाची संस्कृत जातिरचना रेखीव नि शुद्ध दिसते. त्याचें 'तरुणि तवेदं कुचतटयतिगुरु कुरु मम हृदि सादरम् ' हें केशवकरणी जातींतील पद्य या विधानाची यथार्थता पटवील. अण्णा किर्लोस्कर यांनी गीतांच्या चालींना कीर्तनांतून नि तमाशांतून सुशिक्षित रङ्गभूमीवर आणिलें; आणि त्यांची गोडी नवसुशिक्षित समाजासङ्गेच अुदयोन्मुख कवींना पटवून दिली. गोविन्द बल्लाळ देवल यांचीं बहुतेक पद्ये अितकीं सुरस, सुसंस्कृत, विविध आणि निर्दोष आहेत की आधुनिक मराठी कवितेंतील शैथिल्य नाहीसें करण्याचे श्रेय त्यांच्या लोकप्रिय अुदाहरणाला दिलें पाहिजे. जातिरचनेवर लिहू अिच्छिणाऱ्याला देवलांच्या कृतीकडे दुर्लक्ष्य करितांच येणार नाही. केशवसुत, गोविन्द वासुदेव कानिटकर, नारायण वामन टिळक, दत्तात्रय कोण्डो घाटे, माधवानुज, विनायक जनार्दन करन्दीकर अित्यादि आधुनिक मराठी कवींनी जातिरचनेस सुसंस्कृत वाचनीय कवितेच्या क्षेत्रांत रूढ करण्याचें श्रेय सम्पादिलें. आधुनिक मराठी कविता ही बहुतांशी जातिरूपच आहे. मराठी सङ्गीत नाटकांत रा. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी जी गायकी थाटाची क्लिष्टरचना आणिली ती काव्यरचनेस अनुकूल नसल्याने मराठी कवितेच्या बाह्यस्वरूपावर तिचा काहीच परिणाम घडला नाही.
{{gap}}'''(३) वृत्त.'''- छन्द आणि जाति यांव्यतिरिक्त वृत्त हा अेक प्राचीन काळापासून चालत आलेला पद्यप्रकार आहे. संस्कृत वाङ्मयांत हाच विशेष रूढ आहे. व्याकरणमहाभाष्यांतील कारिकाहि काही वृत्तरूप आहेत ही गोष्ट विचारणीय आहे. वृत्तांत अक्षरांच्या सङ्ख्येचे बन्धन असतें अितकेंच नव्हे तर त्यांचा<noinclude></noinclude>
hzv43g82j7bnh304f6niyxxj428bqal
अनुक्रमणिका:आमची युरोपची यात्रा.pdf
106
104088
237507
237484
2026-09-29T07:37:47Z
कल्पनाशक्ती
3813
237507
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=आमची युरोपची यात्रा
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1934
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 6="प्रस्तावना" 7="अनुक्रमणिका" 8="चित्रांची अनुक्रमणिका" 10="यात्रेत यात्रा" 16 ="फ्रान्सची राजधानी पॅरिस"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=

[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
kcd55ixpjc30sm80f4hsgg7vxqvaq66
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१०
104
112195
237502
236956
2026-09-29T07:00:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237502
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{xxxx-larger|'''आमची युरोपची यात्रा'''}}}}
{{center|{{bar|3}}●●●●●{{bar|3}}}}
{{center|{{x-larger|'''प्रकरण १'''}}}}
{{rule|5em}}
{{center|'''यात्रेत यात्रा'''}}
{{center|{{bar|2}}●●●{{bar|2}}}}
{{gap}}{{x-larger|'''को'''}}'''लंबसाचा''' नव्या अमेरिका खंडाचा शोध व वास्को डि गामाचा हिंदुस्थानच्या नव्या जलमार्गाचा शोध हे सारखेच अपूर्व व विलक्षण शोध होते असें आपल्या इकडे इतिहास भूगोल शिकवितांना शाळांतून शिकविलें जातें. हे दोन शोध कांहीं बाबतींत क्रांतिकारक व बहुपरिणामी झाले हें खरें आहे. पण कल्पकतेच्या व ज्ञानवृद्धीच्या दृष्टीनें या दोन शोधांत जमीनअस्मानाचें अंतर आहे. कोलंबसाच्या शोधानें पृथ्वीच्या ज्ञात खंडांमध्ये जवळजवळ दोन खंडांच्या इतक्या विस्ताराच्या भूमिभागाची भर घातली. कारण कोलंबसाच्या काळीं व तत्पूर्वी अमेरिका खंडाच्या अस्तित्वाबद्दल सुधारलेल्या लोकांमध्येसुद्धां पूर्ण अज्ञान होतें. कोलंबसाला नौकानयनाचा जो अनुभव आला होता, त्यानें जलमार्गाच्या ज्या सफरी केल्या होत्या व पृथ्वीच्या आकाराविषयीं व इतर जी अपूर्व भौगोलिक माहिती मिळविली होती, त्या सर्वांवरून त्यानें असा कयास केला कीं, पश्चिम दिशेनें ॲटलँटिक महासागरांतून दूरवर गेल्यास आपल्याला जमीन लागली पाहिजे. या त्याच्या कयासाबद्दल लोक त्याला नादी व वेडगळ समजत. पण कोलंबसाचा आपल्या कयासावर विलक्षण विश्वास होता. म्हणून त्यानें चिकाटीनें व दृढनिश्चयानें आपल्या कयासाची कसोटी पाहण्याचा निश्चय केला व आपली सफर यशस्वी करून दाखवून एका मोठ्या खंडाचा शोध लावला व मानवी<noinclude></noinclude>
kittlr4saik9b4ldvx93tz395rgltun
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१२
104
112197
237503
236960
2026-09-29T07:10:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237503
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||यात्रेत यात्रा|३ }}</noinclude>{{gap}}पूर्व युरोपांतील राष्ट्रांच्या हाती असलेला हा फार किफायतीचा व्यापार आपल्यां हातीं यावा याकरितां तर पोर्तुगाल, स्पेन, फ्रान्स, हॉलंड व इंग्लंड या देशांतील लोकांची चवदाव्या शतकापासून हिंदुस्थानचा स्वतंत्र जलमार्ग शोधून काढण्याची धडपड व खटपट सारखी चालू होती. या खटपटीमध्यें स्पेन व पोर्तुगाल येथील लोक व राजेरजवाडे हे प्रथम पडले होते. हिंदुस्थानचा जलमार्ग शोधून काढण्याची हाव व निदिध्यास इतका जबर होता कीं, कोलंबसाला, नव्या जमिनीचा शोध लागला तेव्हां तो अफाट हिंदुस्थान देशाचाच किनारा असावा असें कोलंबसास वाटलें व म्हणून त्यानें आपण शोधून काढलेल्या नव्या जमिनीस 'पश्चिम हिंदुस्थान' (West Indies) असें नांव दिलें.
{{gap}}हिंदुस्थानचा जलमार्ग आफ्रिकेच्या किनाऱ्याला वळसा घालून शोधून काढण्याची खटपट पोर्तुगीझ लोक व अमीर उमराव करीत होते. दरवर्षी एखाददुसरी सफर काढून पोर्तुगीझ लोकांनी आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याने दक्षिणेस जाण्याचा सारखा सपाटा चालविला होता. सन १४९६ मधील सफरीची कप्तानकी वास्को डि गामाच्या बापाच्या वजनामुळें वास्को डि गामास मिळाली. त्यानें आफ्रिकेचे दक्षिण टोंक केप ऑफ गुड होप हे ओलांडलें व तो पूर्वीपासून ऐकून ठाऊक असलेल्या मोझांबिक बंदरास आला. तेथें थोडी विश्रांति घेऊन व अन्नपाण्याची भरपूर बेगमी करून त्यानें हिंदुस्थानच्या पश्चिम किनाऱ्याच्या दिशेनें आपलें आरमार हांकले व सन १४९८ च्या पावसाळ्याचे आधीं तो केरल प्रांतांतील झामोरिन राजाच्या कालिकत बंदरास आला. याप्रमाणें वास्को डि गामानें हिंदुस्थानचा दूरचा पण सलगचा व स्वतंत्र जलमार्ग शोधून काढून युरोपच्या पश्चिमेकडील राष्ट्रांचा हिंदुस्थानांत चंचुप्रवेश होण्यास मार्ग मोकळा केला. हाच वास्को डि गामाच्या शोधाचा विशेष होय. हा जलमार्ग ठाऊक झाल्याबरोबर पश्चिम युरोपांतील पोर्तुगीझ, फ्रेंच, डच व इंग्रज या निरनिराळ्या राष्ट्रांतील लोकांची हिंदुस्थान व त्याचेही पूर्वेकडील देश व<noinclude></noinclude>
nlwwl4u02muciw9jj6c8zn11pd6cr6j
छन्दोरचना
0
112354
237498
237452
2026-09-28T12:55:49Z
कल्पनाशक्ती
3813
237498
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = छन्दोरचना
| साहित्यिक = डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन
| अनुवादक =
| विभाग =
| मागील =
| पुढील = [[छन्दोरचना/सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण|सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण]]
| वर्ष = 1937
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="छन्दोरचना.djvu" from="1" to="13" />
cv18nwkjhycc05uos4c29cq5yq6n8nw
छन्दोरचना/सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण
0
112363
237499
2026-09-28T12:57:49Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = छन्दोरचना | साहित्यिक = डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन | अनुवादक = | विभाग = | मागील = [[छन्दोरचना/सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण|सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण]] | पुढील = छन्द..."
237499
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = छन्दोरचना
| साहित्यिक = डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[छन्दोरचना/सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण|सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण]]
| पुढील = [[छन्दोरचना/काही छन्दोविषयक प्रश्न|काही छन्दोविषयक प्रश्न]]
| वर्ष = 1937
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="छन्दोरचना.djvu" from="14" to="27" />
4s97h5u5v8ue743de5dxpifwamcmnqb
छन्दोरचना/काही छन्दोविषयक प्रश्न
0
112364
237500
2026-09-28T12:59:39Z
कल्पनाशक्ती
3813
नवीन पान "{{शीर्ष | शीर्षक = छन्दोरचना | साहित्यिक = डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन | अनुवादक = | विभाग = | मागील = [[छन्दोरचना/सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण|सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण]] | पुढील = छन्द..."
237500
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = छन्दोरचना
| साहित्यिक = डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[छन्दोरचना/सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण|सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण]]
| पुढील = [[छन्दोरचना/यमक, यति, अक्षर आणि गण|यमक, यति, अक्षर आणि गण]]
| वर्ष = 1937
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="छन्दोरचना.djvu" from="28" to="75" />
p40ybqhdeo4jeqy6mxzl37mluimgrzn
237501
237500
2026-09-28T13:00:55Z
कल्पनाशक्ती
3813
237501
wikitext
text/x-wiki
{{शीर्ष
| शीर्षक = छन्दोरचना
| साहित्यिक = डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन
| अनुवादक =
| विभाग =
| मागील = [[छन्दोरचना/सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण|सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण]]
| पुढील = [[छन्दोरचना/यमक, यति, अक्षर आणि गण|यमक, यति, अक्षर आणि गण]]
| वर्ष = 1937
| टिपण =
| वर्ग =
| दालन =

<pages index="छन्दोरचना.djvu" from="28" to="74" />
9j8jfc8wsi3wzdmts0cyc8xocrbbeuu
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१३
104
112365
237504
2026-09-29T07:16:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237504
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''४'''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>बेटें यांवर व्यापारी व राजकीय वर्चस्व मिळविण्याकरितां अहमहमिका सुरू झाली व ज्या ज्या लोकांना जेथें जेथे ओसरी मिळाली तेथे तेथें त्यांनीं आपले पाय पसरले. इंग्रजांना अफाट हिंदुस्थान हातपाय पसरण्यास मिळाला व त्यांनीं सबंध हिंदुस्थान आपल्या अंमलाखालीं व वर्चस्वाखालीं आणला. चढाओढींत बाकीचीं राष्ट्रं मागें पडली.
{{gap}}आतां हिंदुस्थान, विलायत व युरोप यांमधील दळणवळणाच्या साधनांत कसकशीं स्थित्यंतरें झालीं याचें थोडें अवलोकन करूं म्हणजे आमची यात्रेत यात्रा कशी घडली हें व स्थलवर्णनाचा क्रम वरकरणी उलटा कां झाला हे ध्यानांत येईल.
{{gap}}वर उल्लेख केल्याप्रमाणें हिंदुस्थान व विलायत यांमध्यें पुरातन काळीं दळणवळण मुळींच नव्हतें. पण हिंदुस्थान व युरोप यांमध्ये अर्धे जलमार्गे व अर्धे खुष्कीचे मार्गे व अरेबिया व इजिप्त या देशांमधून मिश्रमार्गे दळणवळण फार पुरातन काळापासून चालू होतें. वास्को डि गामानें केप ऑफ गुड होपवरून हिंदुस्थानचा सलग व स्वतंत्र जलमार्ग शोधून काढल्यापासून हिंदुस्थान व विलायत यांमध्यें जलमार्गाचें दळणवळण सुरू झालें. पण तें आफ्रिका खंडास वळसा घालून होत असल्यामुळें त्या मार्गानें मुख्य युरोप मुळींच येत नसे. या आठ दहा हजार मैलांच्या प्रवासास जवळजवळ एक वर्ष लागे. पुढें वाफेच्या शक्तीचा शोध लागून त्या शक्तीवर चालणाऱ्या आगबोटी झाल्यापासून हा एका वर्षाचा जलप्रवास सहा महिन्यांवर आला. नंतर सन १८६९ मध्ये सुएझचा कालवा चालू झाल्यामुळे विलायत व हिंदुस्थान यांमधील अंतर हजारों मैलांनी कमी झालें. कारण इंग्लंडपासून केप ऑफ गुड होप हेंच मुळीं सहा हजार मैल आहे. सुएझ कनालच्या सोयीमुळें जिब्राल्टर, भूमध्यसमुद्र, तांबडा समुद्र व अरबी समुद्र या मार्गानें आगबोटी येऊं लागल्या व हिंदुस्थान व विलायत यांमधील अंतर एकंदर सहा हजार मैलच राहिलें. म्हणजे केप ऑफ गुड होपपासून हिंदुस्थानचें अंतर एकंदर जलप्रवासांतून<noinclude></noinclude>
c00trg7qfpejd6pi07m53jepyf2east
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१४
104
112366
237505
2026-09-29T07:22:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237505
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||'''यात्रेत यात्रा'''|'''५'''}}</noinclude>कमी झालें. पण या जवळच्या जलमार्गानें सुद्धां विलायतची यात्रा ही स्वतंत्र होई. वाटेंत युरोपची यात्रा घडत नसे. युरोपांत आगगाड्यांचा प्रसार झाल्यापासून हिंदुस्थान व इंग्लंड यांमधील अंतर आणखी कमी झालें. कारण जिब्राल्टर सामुद्रधुनींतून स्पेन, पोर्तुगाल या देशांना वळसा घालून इंग्लंडला जायचें कारण उरलें नाहीं. तर फ्रान्सच्या दक्षिण किनाऱ्यावरील मार्सेल्स बंदरीं उतरून तेथून फ्रान्स देशाची राजधानी परिस व इंग्लिश खाडीवरील बंदर कॅलेकडून इंग्लंडला जातां येऊं लागलें. तरी पण या मार्गामध्यें युरोपांतला एकच देश व त्या देशाचा पश्चिमेकडील भाग इंग्लंडला जातांयेतां फार तर पहातां येई. पण युरोपचे इतर देश पहाण्यास स्वतंत्र व निराळी सफर लागे. सुएझ कॅनाल झाल्यापासून व पी. आणि ओ. कंपनीच्या आगबोटी सुरू झाल्यापासून हिंदुस्थानांतून पुष्कळ लोक विलायतची यात्रा करून येत. पण युरोपची यात्रा करण्यास आगगाडीचा निराळा व स्वतंत्र खर्च करावा लागे. त्या काळी सुद्धां इटलीच्या ब्रिंडिसी बंदरास उतरून युरोपमधून जातां येणें शक्य होतें. पण त्याला फार खर्च येई. म्हणून बहुधा सर्व लोक मार्सेल्सवरूनच जात.
{{gap}}पण महायुद्धानंतर इटली देशानें आपलें व्यापारी आरमार वाढविलें व त्याच्या आगबोटी सर्व जगभर जाऊं लागल्या. त्यांनीं हिंदुस्थानशीं सुद्धां सररहा दळणवळण सुरू केलें. त्यांनी मुंबई ते लंडनच्या जातांच्या व जातां येतांच्या सफरीचें भाडें पी. आणि ओ. कंपनीच्यापेक्षां किती तरी कमी केलें. मला सन १९२९ ते १९३० सालांत दोन वर्षांच्या मुदतीच्या जातांयेतांचें दुसऱ्या वर्गाचें भाडें ८६ पौंड (सुमारें बाराशें रुपये) पडलें. हल्ली तर त्या कंपनीनें आगबोटीमध्यें 'काटकसरी दुसरा वर्ग' अथवा इंटरमीडिएट वर्ग काढून मुंबई ते लंडनच्या जातांच्या सफरीचें भाडें २५ पौंड (सुमारें साडे तीनशे रुपये) व सहामाही मुदतीचें भाडें ४३ पौंड (सुमारें पावणें सहाशें रुपये) केलें आहे. इटली देशांतील '''जिनोआ, व्हेनिस व ट्रीस्ट''' या तिन्ही बंदरांपासून आगबोटी जाण्यायेण्याची सोय झाल्यामुळे विलायतेस जातांयेतां युरोपची यात्रा सहज व फारसा<noinclude></noinclude>
edurbu1kbbpxjzimxegiv051wxse1ae
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१५
104
112367
237506
2026-09-29T07:29:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237506
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''६'''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>अधिक खर्च न पडतां उरकून घेतां येण्याची मोठी सोय झाली आहे. जिनोआ बंदरास उतरल्यावर '''मौंट सेनीस'''च्या बोगद्याच्या आगगाडीच्या रस्त्याने गेल्यास फ्रान्सचा बराच भाग पाहण्यास सांपडतो; दुसऱ्या '''सिंप्लॉन''' बोगद्याच्या मार्गे गेल्यास नितांत रमणीय अशा स्वित्झरलँडचा बराच भाग व फ्रान्सचा थोडासा भाग पाहण्यास मिळतो; तिसऱ्या '''सेंट गॉटर्ड''' बोगद्याच्या मार्गाने गेल्यास ऱ्हाईन नदीथडीचा जर्मनीचा सुंदर व सुपीक प्रांत व बेलजम देश पहावयास सांपडतो. व्हेनिस बंदरास किंवा ट्रीस्ट बंदरास उतरल्यावर तर युगोस्लोव्हिया, ऑस्ट्रिया, जर्मनीचा मध्यप्रांत व हॉलंड हे देश सहज पाहून होतात.
{{gap}}याप्रमाणें इटालियन आगबोटींच्या रहदारीनें यात्रेत यात्रा कमी खर्चात उरकण्याची मोठी सोय झाली आहे. मीं याच सोयीचा फायदा घेऊन विलायतेहून देशीं परत येतांना युरोपचे तीन देश पाहिले. जातांना जर मी थांबत थांबत प्रवास केला असता तर आणखी देश पहातां आले असते. कारण आपल्याला जातायेतां निरनिराळा मार्ग पसंत करता येतो. पण मीं जातांयेतां सिंपलॉन बोगद्याचा मार्गच ठरविला होता.
{{gap}}माझी युरोपची यात्रा पॅरिसपासून सुरू झाली व तिचें वर्णन म्हणजे फ्रान्स, स्वित्झरलंड व इटली देशांतल्या कांहीं स्थळांचेंच वर्णन होणार. पण माझा मुलगा चि. मनोहर हा एका सुट्टीत प्रख्यात सुपीक व सुंदर ऱ्हाईन- थडीचा प्रवास करून आला होता. म्हणून या त्याच्या यात्रेचेही वर्णन त्याचेकडून लिहवून या प्रवासवृत्तांत सामील केलें आहे.
{{gap}}आपल्या देशांत वृद्ध वडिलांची अशी इच्छा असते कीं, आपल्या वृद्धावस्थेमध्यें आपल्या मुलानें आपल्या संसाराचा भार उचलावा. त्याप्रमाणे माझ्या मुलानें माझ्या वाङ्मयसंसाराचा भार उचलण्यास मदत केली याबद्दल मला फार आनंद होत आहे. तेव्हां आतां अधिक पाल्हाळ न लावतां मी हे प्रास्ताविक प्रकरण आटोपतें घेऊन पॅरिसच्या प्रकरणास एकदम प्रारंभ करतों.

{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
hrjzebvr5h12d4q80rge2k82n7dc6c2
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१६
104
112368
237508
2026-09-29T07:38:11Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237508
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>

{{center|{{x-larger|'''प्रकरण २ रे'''}}}}
{{rule|5em}}
{{center|'''फ्रान्सची राजधानी पॅरिस'''}}
{{center|{{bar|2}}●●●{{bar|2}}}}
{{gap}}{{x-larger|'''आ'''}}'''मच्या'''धार्मिक यात्रेमध्यें ज्याप्रमाणें यात्रेकरू प्रथम काशीस जातो व मग परत प्रयागला येतो त्याप्रमाणें माझ्या युरोपच्या यात्रेमध्यें मी प्रथम लंडनला गेलों व तेथें बराच काळ घालविल्यावर मग परत फिरतांना पॅरिसला आलों. तेथें मी एक '''दशवडा''' (दहा दिवस) राहिलों. या प्रकरणांत पॅरिसची पूर्वपीठिका आणि शहरांतील व आसपासचीं प्रेक्षणीय स्थळें यांचें वर्णन व पूर्व माहिती देण्याचा मानस आहे.
{{gap}}लंडन शहर पाहिल्यानंतर पॅरिस शहर पाहिलें म्हणजे या दोन शहरांतील साधर्म्य व वैधर्म्य चटकन् ध्यानांत आल्याखेरीज रहात नाहीं.
{{gap}}दोन्हीं जगविख्यात राजसत्तांचीं राजधान्यांचीं शहरें आहेत; दोन्हीं सपाट प्रदेशांतून वाहणाऱ्या नद्यांच्या दोन्ही कांठांवर वसलेली शहरें आहेत; दोन्हीं चांगलीं बंदरें असून उद्योग व व्यापार यांचीं केन्द्रे आहेत. दोन्हीं पुरातन काळापासून प्रसिद्ध अशीं शहरें आहेत. पण लंडन हे जगांतील सर्वांत मोठे शहर आहे, तर पॅरिस हें तिसरें मोठे शहर आहे. लंडनमध्ये वाहनें डाव्या हाताकडून हाकण्याचा नियम आहे, तर पॅरिसमध्यें त्याच्या उलट नियम आहे. पॅरिसमध्यें रस्त्याच्या बाजूच्या फरसबंदी पायवाटांवर उघड्यावर चहा-कॉफी पीत खुशालपणे सर्व लोक बसतात, तर लंडनमध्यें हे रूढिबाह्य वर्तन गणलें जातें. लंडनची हवा पावसाळी, अभ्राच्छादित किंवा धुक्याची असते व चकचकीत प्रकाश फार थोड्या वेळां असतो, तर पॅरिसमध्यें सुंदर व प्रसन्न सूर्यप्रकाश दिवसचे दिवस पडतो. लंडनमध्यें प्रशस्त रुंद रस्त्यांचा दुष्काळ, तर पॅरिसमध्यें अशा रस्त्यांचा सुकाळ. लंडनमध्यें दाट वस्ती-<noinclude></noinclude>
dgotbysvlc9q1aaq17h1yaeqzm0xftb
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१७
104
112369
237509
2026-09-29T07:45:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237509
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|'''८'''|'''आमची युरोपची यात्रा'''|}}</noinclude>च्यामध्ये खुल्या बागा व जागा आहेत खऱ्या, पण पॅरिसमध्ये त्यापेक्षां कितीतरी विस्तीर्ण बागा व खुल्या जागा आहेत. लंडनमध्यें पुतळे दशकड्यांनी मोजण्याइतके आहेत, तर पॅरिसमध्ये शेंकड्यांनी मोजण्याइतके आहेत. सारांश, या दोन शहरांत पुष्कळ बाबतींत साम्य तर पुष्कळ बाबतींत विरोध दिसून येतो.
{{gap}}सध्यांचें पॅरिस शहर सेन नदीच्या दोन्ही बाजूंस सारखेच विस्तार पावलेलें आहे. ही नदी फ्रान्स देशाच्या आग्नेय टोकाला असलेल्या '''दीयां''' शहरानजीकच्या डोंगराळ प्रदेशांतून निघून सामान्यतः वायव्य दिशेनें वाहत जाऊन '''हाव्र''' बंदराजवळ इंग्लिश खाडीला मिळते. या नदीची एकंदर लांबी चारसाडेचारशे मैल आहे व पॅरिस शहर साधारणपणें या नदीच्या लांबीच्या मधोमध वसलेले आहे. शहराच्या आग्नेय दिशेस शहराच्या पलीकडे चार मैलांवर '''सेन''' नदीला '''मार्न'''नदी येऊन मिळते. '''सेन''' नदी पॅरिस शहरांत आग्नेय दिशेकडून शिरते व एका धनुष्याकार वाकणानें वायव्य दिशेस शहराच्या बाहेर पडते. यामुळे नदीच्या उत्तरेचा भाग व नदीच्या दक्षिणेचा भाग असे शहराचे दोन भाग पडतात. शहराच्या मधोमध पण जरा पूर्वेकडच्या ठिकाणीं '''सेन''' नदीचे दोन फाटे होऊन त्या फाट्यांमध्यें दोन लहान मोठीं बेटे बनलीं आहेत. ही बेटांची दुक्कल हल्लींच्या पॅरिस राजधानीचें मूळ वस्तीचें ठिकाण. जेव्हां रोमन लोकांनीं गॉल देश (फ्रान्सचें जुनें नांव) काबीज केला तेव्हां ह्या बेटांत त्यांनीं आपलें लष्करी ठाणें बसविलें. रोमन गव्हर्नर येथेंच राहत असे. पुढें ख्रिश्चनधर्माच्या प्रसारानंतर या बेटांवर एक प्रख्यात प्रार्थनामंदिर बांधण्यांत आलें. पॅरिसचें हें मूळ बेट पाहिलें म्हणजे आपल्याला कावेरी नदीच्या दोन फाट्यांनी बनलेल्या श्रीरंगपट्टण या बेटाची व शहराची आठवण झाल्याखेरीज रहात नाहीं. कावेरी नदीमधील बेट सुमारें तीन मैल रुंद असल्यामुळे बेटावरच श्रीरंगपट्टण नांवाचें मोठें शहर वसलें व टिपू सुलतानच्या कारकीर्दीमध्यें तें राजधानीचें व दाट वस्तीचें शहर बनलें होतें. म्हणून नदीच्या फांट्याच्या पलीकडे शहराचा विस्तार<noinclude></noinclude>
db1t4o18ndmmlp4b8ec6mh7iiedg3ob
पान:आमची युरोपची यात्रा.pdf/१८
104
112370
237510
2026-09-29T07:55:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237510
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||'''फ्रान्सची राजधानी पॅरिस'''|'''९'''}}</noinclude>झाला नाहीं; शिवाय टिपूच्या नंतर तें राजधानीचे शहर राहिलें नाहीं म्हणून तें मोडकळीस आलें. पॅरिस शहराचें मूळ ज्या लहान बेटांमध्यें सुरू झालें तीं बेटें फारच छोटीं आहेत; आपल्या इकडल्या कांहीं खाड्यांमध्यें ज्या प्रकारचीं लहान लहान जुईठी बनतात, तशीं ती लहान लहान बेटें आहेत. पश्चिमेकडच्या बेटाचें नांव फ्रान्सचें बेट किंवा शहरचें बेट असें आहे व पूर्वेकडच्या बेटाचें नांव '''सेंट लुई''' असें आहे. दोन्ही बेटांची मिळून लांबी पुरी एक मैल सुद्धां नाहीं; रुंदी दोन अडीच फर्लांग फार तर भरेल! इतकीं हीं बेटें लहान आहेत. पग रोमन लोकांचे आधींपासून '''पारिसी''' नांवाच्या गॉल लोकांच्या एका छोट्या टोळीनें या दोन छोट्या बेटांवर वसाहत केली होती; व म्हणून या शहरास '''पॅरिस''' असें नांव पडलें. रोमन लोकांच्या हल्ल्याला पारिसी टोळीनें पुष्कळ काळ थोपवून धरलें; पण शेवटीं रोमन लोकांनीं तें शहर काबीज केलें व त्याला '''लुटेटिया''' असें नांव दिलें. रोमन लोकांच्या कारकीर्दीत या बेटावर जुपिटर देवाचें देऊळ होतें. पुढे इसवी सनाच्या तिसऱ्या शतकांत पारिसी टोळीनें ख्रिश्चनधर्म स्वीकारला. त्यांचा पहिला बिशप '''सेंट डेनीस''' हाच पॅरिस शहराचा '''आश्रयदाता संत''' गणला गेला; सेन नदीच्या उत्तरेकडील भागाला याच साधूचें नांव मिळालें व '''सेंट डेनीस''' नांवाचें प्रार्थनामंदिर फ्रेंच राजांचें कबरस्थान बनलें. सन ४७५ पर्यंत फ्रान्स देश रोमन लोकांच्या ताब्यांत होता. पण '''क्लोव्हिस''' या फ्रँकिश राजानें सर्व फ्रान्स आपल्या ताब्यांत आणिला, व तो फ्रँकिश राजघराण्याचा स्थापक झाला. त्यानें सेंट '''जनव्हिएव''' या पॅरिसच्या संतबाईच्या प्रेरणेनें ख्रिश्चनधर्म स्वीकारला. म्हणून '''जनव्हिएव''' ही सुद्धां पॅरिसची आश्रयदाती समजली जाते.
{{gap}}'''क्लोव्हिस''' राजानें '''पॅरिस''' ही आपली राजधानी केली. '''शार्लमेन''' नांवाचा प्रख्यात राजा आठव्या शतकांत उदयास आला. पुढें दहाव्या शतकांत '''ह्यूज''' राजा झाला. त्यानें बेटावर एक राजवाडा बांधला. '''सातव्या लुई''' राजानें प्रख्यात प्रार्थनामंदिर '''नोत्रदाम''' (आमची आई)<noinclude></noinclude>
almms1ejfeux1bnwm2ovxq66a0awi27