विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:छन्दोरचना.djvu/57
104
5773
237524
15560
2026-09-30T10:53:32Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237524
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''३०'''|}}</noinclude>लगक्रमहि निश्चित असतो. या प्रकारास अक्षरवृत्त वा वर्णवृत्त म्हणतात; पण यास केवळ '''वृत्त'''<ref>निरञ्जन-माधव आधार देत नाही पण वृत्ताच्या ठिकाणी 'व्यक्ति' ही संज्ञा देतो. {{Block center|<poem>"व्यक्ति या समपादांतें पूर्वाचार्यी निरूपिले;
जातिव्यक्तिद्वयामध्ये छन्दः शास्त्र विरूढलें" (निमास २०-२१)</poem>}}</ref> म्हणावें.
{{gap}}मराठींत वृत्तरचना प्रथम केल्याचा मान महानुभाव कवींचा दिसतो. भास्कर कृत 'अीशस्तुती' मधील पुढील श्लोकावरून त्यावेळच्या रचनेची चागली कल्पना येअील.
{{Block center|<poem>"तें कै देखौन डोळां परतर सुफळा सृष्टि हे जीवितेसी
कैश्या जङ्घा सुरेषा अुपर घणतरी जन्मभूमी अनङ्गा
सेला मध्ये प्रदेश मिरवतु सजनी मालगण्टी पवेशा
वेठीला योगिराजें करवितु सहजें पारणें लोचनांसी"</poem>}}
{{gap}}भास्कर<ref>पहा वि. ल. भावे यांचा लेख वि. विस्तार ५५।५. वि. ल. भावे पुढे म्हणतात कीं "सुन्दर, मनोहर, मन्द्र, तरङ्गिणी, चित्रकला, सुरती, सम्भोगा, सुरमा, सुमुखी, विमला, सानन्द, रामा, रमण, पादाकुल, मुक्तवल्ली, चन्दनक, गन्धानक, फणीन्द्र, हीं त्यांतील वृत्तें अपरिचित अशींच आहेत." या वृत्तांचें ज्ञान व्हावें म्हणून मी रुक्मिणी स्वयंवराच्या प्रतीसाठी शोध केला. यवतमाळचे श्री. वामनराव नारायण देशपाण्डे यांच्या कृपेने या ग्रन्थाची जी अेक अपूर्ण सदोष प्रत मला पहायला मिळाली तिचा अुपयोग जो होऊं शकला तो मी करून घेतला आहे. परन्तु कित्येकदा प्राचीन वृत्तांसच नवीन नावें दिल्याचा संशय येतो. शार्दूलविक्रीडित, दोधक, चामर आणि यूथिका यांस अनुक्रमें अिन्द्रकल्हार, चन्दनबळी, तुनी आणि वनीमाळा हीं नावें आढळली. स्रग्धरा आणि स्रविणी यांचे सर्गधारा आणि शृङ्गवेणी असे चमत्कृतिजनक अपभ्रंश आढळले!</ref> म्हणजे कवीश्वर व्यास याने शके बाराशे पूर्वीच श्लोकरचना करण्यास आरम्भ केला; पण याचे श्लोक निर्यमक आहेत. या वेळेपासून महानुभाव ग्रन्थकार विविध वृत्तांत रचना करूं लागले. यापुढे शम्भर वर्षांनी सयमक-<noinclude>
{{reflist}}</noinclude>
hyz96q5dox9bcgwt7v5ru9bxv7nftba
पान:छन्दोरचना.djvu/58
104
5774
237525
15561
2026-09-30T11:02:49Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237525
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''३१'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>रचना होअू लागली. तेराव्या शतकाच्या शेवटी तर श्लोकबद्ध सयमकरचनेचा प्रघात पुष्कळच पडला आणि चौदाव्या शतकापासून ते नवीं नवीं वृत्तेंहि योजूं लागले. कृष्णमुनीने<ref>प्रो. वि. भि. कोलते यांचा 'महानुभावीय काव्यांतील कांहीं नवीन छन्द' (संधिकाल, ऑगस्ट १९३५ चा अंक) हा लेख पहा.</ref> शके १५७४ च्या सुमारास लिहिलेलें 'रुक्मिणी स्वयंवर' आणि ओङ्कारमुनीने शके १६३० च्या सुमारास लिहिलेलें 'लक्ष्मणा- स्वयंवर' या काव्यांत पाच-अक्षरी वृत्तापासून ते वीस-अक्षरी वृत्तांपर्यन्त अनेक वृत्तें योजिली आहेत.
{{gap}}मुक्तेश्वराने आपल्या रामायणाची रचना विविध वृत्तांत केली आहे तरी भुजङ्गप्रयाताचे प्रमाण मोठें दिसतें. शेवटी शेवटीं पादाकुलक जातीचाहि अवलम्ब त्याने केला आहे. मुक्तेश्वराची प्रतिभा वृत्तबन्धनांत जखडल्यासारखी वाटते. वामनाने अनेक वृत्तांत रचना करून मराठी भाषेला रुळविली आणि वृत्तरचनेला यमकानुप्रासांनी मण्डित करून 'सुश्लोक वामनाचा' सुप्रसिद्ध करून टाकिला. आधुनिक दृष्टीला वामनाची कृति शिथिल नि क्लिष्ट वाटते. वामनापासून चमत्कृतिजनक रचनेला विशेष महत्त्व येअू लागलें. विठ्ठल नि आनन्दतनय यांची रचना दुर्बोध आणि चमत्कृतिजनकच विशेष आहे. रघुनाथपण्डिताची रचना मात्र जितकी सालङ्कृत तितकीच रसाळ आणि शुद्ध आहे; पण ती विपुल नाही. 'विद्वज्जीवन'कार विठ्ठल मुद्रालङ्काराने विविध वृत्तांची नावें ग्रथित करितो पण त्यांत ढोबळ चुका करितो. अनन्त कवीने देवराज, प्रमाणिका, विबुधप्रिया, विभावरी आणि श्येनिका या दुर्मिळ वृत्तांचा मोठ्या प्रमाणांत अुपयोग केला आहे. निरञ्जन-माधवाने विविध वृत्तांत चमत्कृतिजनक आणि विपुल रचना केली असून छन्दःशास्त्रावरहि सद्वृत्त मुक्तावलि ही पुस्तिका लिहिली आहे.
{{gap}}कवि हा भाषेचा पालक आहे ही जाणीव सदैव मनांत वागवून व्याकरण- शुद्ध, प्रौढ आणि सुसंस्कृत भाषेत निरनिराळ्या कठिण वृत्तांतहि विपुल आणि सालङ्कृत रचना करणारा मोठा पद्यप्रभु म्हणजे मोरोपन्तच होय. दण्डकरचना<noinclude>
{{reflist}}</noinclude>
mzz72hwj3nqqzh2d15de2ebhtcmrp4l
पान:छन्दोरचना.djvu/59
104
5775
237526
15562
2026-09-30T11:09:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237526
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''३२'''|}}</noinclude>त्याच्याच काव्यांत आढळते. त्याने घनाक्षरी,<ref>अहल्योद्धार.</ref> अभङ्ग या प्रकारची छान्दस रचना संस्कृतांतहि करून ठेविली आहे. परन्तु आश्चर्याची गोष्ट ही की जातिरचना करितांना त्याच्या हातून कर्णकटु यतिभङ्ग फार होतात. यावरून त्याला
गाण्याचा कान नसावा.
{{gap}}आधुनिक मराठी कवींच्यापैकी भास्कर दामोदर पाळन्दे यांनी निरनिराळ्या वृत्तांची अुदाहरणे देण्यासाठीच की काय, अनेक वृत्तांत अीश्वराची रसाळ आळवणी केली आहे. विद्याधर वामन भिडे यांनी राघवीय परीवाहाच्या ११ व्या सगात आणि दण्डदण्डना काव्यांत भिन्न भिन्न वृत्तें अक्षरसङ्ख्येच्या वाढत्या क्रमाने दिली आहेत. त्यांच्या जीवजागृति या काव्यसङ्ग्रहांत अनेक दुर्मिळ वृत्तांचा परामर्श घेण्यांत आला आहे. परन्तु वृत्तांची नावे देतांना ते आधार देत नाहीत हे मोठेंच वैगुण्य आहे. त्यांनी 'कमलिनी' इत्यादि काही नवीं वृत्तें साधिली असून अेका अरबी-फार्सी वृत्ताला 'सौदामिनी' हे नाव देऊन तें वृत्त रूढ करण्याचा प्रयत्न फार पूर्वी केला आहे. अलीकडे त्यांनी अनेक अरबी-कासीं वृत्तांतहि रचना करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची रचना वृत्तशुद्ध असली तरी सुबोध आणि सरस नसते. सुमन्तकृत 'माझे दुर्दिन' ही पुस्तिका केवळ काही दुर्मिळ आणि अपरिचित वृत्तांच्या अुदाहरणांसाठीच अवलोकनीय वाटेल. भागानगरकर यशवन्तरावजी कोरेकल यांनीहि विविध अपरिचित वृत्तांत सुबोध नि बोधप्रद पद्य रचण्याचा प्रयत्न केला आहे. वासुदेव वामन खरे, विद्याधर वामन भिडे आणि साधुदास यांनी प्राचीन महाकाव्याच्या धर्तीवर महाकाव्यें लिहिली आहेत. खण्डकाव्य हे मेघदूताप्रमाणे अेका वृत्तांतच लिहिण्याकडे कवींची प्रवृत्ति विशेष आहे. विठ्ठल भगवंत लेम्भे यांचें शोकावर्त पृथ्वीवृत्तांत आहे; तर राजकवि चन्द्रशेखरकृत वसन्तमाधव हे वसन्ततिलकावृत्तांत आहे. सारखें वृत्त बदलल्याने वाचकाला त्याच्या तन्द्रीत धक्के बसतात. गजलांत योजिली जाणारीं अरबी वृत्तें हीं वृत्ते आहेत यांची जाणीव नसल्याने अण्णा किर्लोस्कर, वासुदेव नारायण डोङ्गरे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शिवराम महादेव परांजपे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वासुदेवशास्त्री खरे अित्यादि नाटककारांची गज्जलरचना<noinclude>
{{reflist}}</noinclude>
7dksj72uo3i6ebm99d6ryz4px5gn887
237527
237526
2026-09-30T11:09:58Z
कल्पनाशक्ती
3813
237527
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''३२'''|}}</noinclude>त्याच्याच काव्यांत आढळते. त्याने घनाक्षरी,<ref>अहल्योद्धार.</ref> अभङ्ग या प्रकारची छान्दस रचना संस्कृतांतहि करून ठेविली आहे. परन्तु आश्चर्याची गोष्ट ही की जातिरचना करितांना त्याच्या हातून कर्णकटु यतिभङ्ग फार होतात. यावरून त्याला गाण्याचा कान नसावा.
{{gap}}आधुनिक मराठी कवींच्यापैकी भास्कर दामोदर पाळन्दे यांनी निरनिराळ्या वृत्तांची अुदाहरणे देण्यासाठीच की काय, अनेक वृत्तांत अीश्वराची रसाळ आळवणी केली आहे. विद्याधर वामन भिडे यांनी राघवीय परीवाहाच्या ११ व्या सगात आणि दण्डदण्डना काव्यांत भिन्न भिन्न वृत्तें अक्षरसङ्ख्येच्या वाढत्या क्रमाने दिली आहेत. त्यांच्या जीवजागृति या काव्यसङ्ग्रहांत अनेक दुर्मिळ वृत्तांचा परामर्श घेण्यांत आला आहे. परन्तु वृत्तांची नावे देतांना ते आधार देत नाहीत हे मोठेंच वैगुण्य आहे. त्यांनी 'कमलिनी' इत्यादि काही नवीं वृत्तें साधिली असून अेका अरबी-फार्सी वृत्ताला 'सौदामिनी' हे नाव देऊन तें वृत्त रूढ करण्याचा प्रयत्न फार पूर्वी केला आहे. अलीकडे त्यांनी अनेक अरबी-कासीं वृत्तांतहि रचना करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांची रचना वृत्तशुद्ध असली तरी सुबोध आणि सरस नसते. सुमन्तकृत 'माझे दुर्दिन' ही पुस्तिका केवळ काही दुर्मिळ आणि अपरिचित वृत्तांच्या अुदाहरणांसाठीच अवलोकनीय वाटेल. भागानगरकर यशवन्तरावजी कोरेकल यांनीहि विविध अपरिचित वृत्तांत सुबोध नि बोधप्रद पद्य रचण्याचा प्रयत्न केला आहे. वासुदेव वामन खरे, विद्याधर वामन भिडे आणि साधुदास यांनी प्राचीन महाकाव्याच्या धर्तीवर महाकाव्यें लिहिली आहेत. खण्डकाव्य हे मेघदूताप्रमाणे अेका वृत्तांतच लिहिण्याकडे कवींची प्रवृत्ति विशेष आहे. विठ्ठल भगवंत लेम्भे यांचें शोकावर्त पृथ्वीवृत्तांत आहे; तर राजकवि चन्द्रशेखरकृत वसन्तमाधव हे वसन्ततिलकावृत्तांत आहे. सारखें वृत्त बदलल्याने वाचकाला त्याच्या तन्द्रीत धक्के बसतात. गजलांत योजिली जाणारीं अरबी वृत्तें हीं वृत्ते आहेत यांची जाणीव नसल्याने अण्णा किर्लोस्कर, वासुदेव नारायण डोङ्गरे, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, शिवराम महादेव परांजपे, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, वासुदेवशास्त्री खरे अित्यादि नाटककारांची गज्जलरचना<noinclude>
{{reflist}}</noinclude>
1lx0o9jvtvki55t0ch7eor8av4il272
पान:छन्दोरचना.djvu/60
104
5776
237528
15563
2026-09-30T11:20:08Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237528
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''३३'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>शिथिल झाली आहे. या प्रकरणी झालेली विविध वृत्तशुद्ध रचना सारी प्रस्तुत ग्रन्थकाराच्या 'गज्जलाञ्जलि' या ग्रन्थांत प्रकाशित आहे.

{{center|'''२० मुक्त पद्याचे प्रयोग'''}}
{{gap}}मराठींतील पद्यरचना वृत्त, जाति आणि छन्द या तीन प्रकारचीच नाही. अलीकडे मुक्त पद्याचा प्रयोग आणि पुरस्कार होअू लागला आहे.
{{gap}}श्रीयुत यशवन्त भास्कर जठार यांनी कानडी कवि श्री. लक्ष्मीश याच्या जैमिनीभारताच्या पहिल्या सन्धीचें समवृत्त भाषान्तर करून मराठीस अेका परप्रान्तीय पद्यप्रकाराचा परिचय करून दिला आहे:-
{{gap}}"श्रीवधूलोचनचकोरक खुलवित भक्तावलीहृत्कुमुदकोरक फुलवित जगतीवलयविमलसौभाग्यरत्नाकरा आणीत भरती अति । तेवि अविरत सरसकरुणासुधाकलांनी विंशदमधुहास्यकौमुदी पसरवित देवपुरलक्ष्मीरमणवदनचन्द्र आनन्द देवो अम्हांला" ॥ १ ॥

{{center|'''चूर्णिका'''}}
{{gap}}याला पद्य कां म्हणतात हे काही ध्यानांत येत नाही. हें पद्य आणि चूर्णिका यांत काही मौलिक भेद दिसत नाही. मराठी चूर्णिकेत यमकें साधिलेली दिसतात तीं मात्र या कानडी पद्यप्रकारांत दिसत नाहीत. कानाला हें गद्यच वाटतें. गद्याला भरत चूर्ण म्हणतो (भ १५/३५), पुढे गद्य टीकेला चूर्णी म्हणूं लागले; आणि शेवटीं विशिष्ट प्रकारच्या गद्यरचनेला चूर्णिका म्हणण्यांत येअू लागलें.
{{Block center|<poem>"अकठोराक्षरं स्वल्पसमासं चूर्णकं विदुः
तत्तुवैदर्भरीतिस्थं गद्यं हृद्यतरं भवेत्" (गछ ७।३)</poem>}}
अमृतरायाच्या ध्रुवचरित्रांतून पुढे अुद्धृत केलेली चूर्णिका पहा.
{{gap}}"साम्प्रत कलङ्किक अवतार झाला नसतांहि म्लेंच्छसंहारादि भगवच्चरित्रे व्यासाज्ञेने जयदेवादिकीं अष्टपदींत वर्णिलीं । तीं श्रोत्यांहीं 'साधु साधु!' शब्दे अतिसत्कारें आकर्णिलीं । अधुनाहि भाविभगवद्गुणानुवादवर्णनपरिणालिका चालली । याचप्रकारें नारदें ध्रुवातें हरिकथापरिपाठी सङ्गितली । 'रे रे ध्रुवा<noinclude>
{{gap}}छ. ३</noinclude>
qwq3eefi0tv3tkl9oinj065pqb0vr5j
पान:छन्दोरचना.djvu/61
104
5777
237529
15564
2026-09-30T11:28:52Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237529
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''३४'''|}}</noinclude>ताता, पूर्णपरब्रह्म रामकृष्णादि अवतार पुढे जन्मतील त्यांची लीला निःशङ्क गात जावी । लज्जा त्यजावी । चरित्रे पाठ करावीं । नामें दीर्घस्वरें अुच्चारावीं' । हे आज्ञा स्मरोनी ध्रुव मधुवनचारी, अुत्तमाधिकारी, यमुनातीरविहारी, कृतशौच दन्तधावनोत्तर प्रातःस्मरणपूर्वक स्नानसन्ध्यादिक आवश्यक आचरौनि हरिकीर्तनीं रङ्गला । करतालिकायुक्त नर्तन, हावभावसहित नामावर्तन करूं लागला ।" (अकस ८)
{{gap}}यावरून मराठींत '''चूर्णिका''' म्हणजे थोडें गळ्यावर म्हणावयाच, सुसंस्कृत समस्तपदप्रचुर, नादगौरवयुक्त आणि सयमक असें गद्य होय हे विशद होअील.
{{gap}}निरञ्जनमाधवाने आपल्या 'सुभद्रास्वयंवरचम्पू' काव्यांत (निमाक ३।६६) चूर्णिकेचा अुपयोग ठिकठिकाणी केला आहे. चूर्णिकेत आवर्तनात्मक आन्दोलन नाही. तथापि पाण्डुरङ्गकविकृत स्थालीपाककथेंतील चूर्णिकेंत सप्तमात्रक आवर्तन असावेसे वाटतें. हें सप्तमात्रक आवर्तन नकळतहि आलेलें असेल.
{{gap}}"येरिकडे ऋषिभार देखति सारचोजगङ्गादिका । पञ्चपुरुषेसि पतिव्रता भलि निर्मि नूतन ते कनकाम्बरा । सुन्दरा अतिपामरा मज वर्णवेल किति सत्वरा ।" अित्यादि (अकलका २।१२९ ).
{{gap}}याला शिथिल पद्य म्हणतां येअील; कारण पद्य म्हणजे लयबद्ध अक्षरप्रबन्ध होय. तालाचें बन्धन सोडल्यावर होणारी स्वाभाविक रचना म्हणजे गद्यच होय.
{{Block center|<poem>{{gap}}"अेका मुलग्याने
{{gap}}पाहिली कळी
गुलाबाची कळी बहु गुलजार
{{gap}}तिला भुलुनिया तो जवळी
गेला, होअुनि लम्पट फार!
{{gap}}गुलाबाची कळी
{{gap}}गुलाबाची कळी
गुलाबाची कळी बहारदार !" (केक १८५)</poem>}}
{{gap}}Goethe च्या The Wild Rose च्या या केशवसुतकृत भाषान्तरांतील काही ओळी पद्मावर्तनी आहेत आणि काही नाहीत. ज्या नाहीत त्या बसवायच्या<noinclude></noinclude>
feazdha62n6mb6blmk68a88cm0qqtq1
पान:छन्दोरचना.djvu/62
104
5778
237530
15565
2026-09-30T11:38:20Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237530
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''३५'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>म्हटल्या की शब्दांचे हाल करावे लागतात आणि ते केल्यास कवितावाचनाने होणाऱ्या आनन्दांत तितकी न्यूनता येते. थोडा शाब्दिक फेरफार केल्यास हा दोष निघून जातो, पहा:-
{{Block center|<poem>अेक मुलाने पहा बघितली
{{gap}}गुलाबकलिका बहु गुल्जार
तिला भुलुनिया धावत जवळी
{{gap}}गेला होअुनि लम्पट फार
गुलाबकलिका, गुलाबकलिका,
{{gap}}गुलाबकलिका बहारदार !</poem>}}
{{gap}}हें अधिक आनन्ददायक वाटतें; यापासून बान्धसूद सुबकपणा पाहिल्याचा आनन्द होती. पद्यरचना जितकी शिथिल तितकी ती स्वाभाविक असत असें मानणे चुकीचे आहे.

{{center|'''लयमुक्त स्वैरपद्य'''}}
{{gap}}परन्तु मराठींतील वृत्त, जाति वा छन्द यामध्ये प्रतिभेला मुक्त विलास करितां येत नाही या समजुतीने अिङ्ग्रजींतील मुक्तपद्याच्या (Free verse) धर्तीवर काही रचना सहेतुकपणे मराठीत होअू लागली आहे. गद्यातील शब्दांचा स्वाभाविक क्रम निष्कारण फिरवून, स्वैरपणानें त्याचे तुकडे तोडून, ते अेकाखाली अेक लिहून जें स्वरपद्य सिद्ध होतें तें अधिक स्वाभाविक कसें हें समजत नाही.
{{gap}} गोविन्दाग्रजांनी आपल्या वाग्वैजयन्तीची जी अर्पणपत्रिका लिहिली आहे ती स्वैरपद्याच्या दृष्टीने चिन्तनीय आहे.
{{block center/s}}
{{gap}}"सत्-चित्-हृत्-महत्
आनन्द-पदवी-प्रदान-वदन्या ॥{{gap}}१
प्रीतीची पवित्रता, चिरन्तनाची चरित्रता,
{{gap}}सृष्टीची सचित्रता,
विश्वाची विविधता, अनन्ताची अगाधता,<noinclude>{{block center/e}}</noinclude>
p22nknyy7vjhccvztjsgafpc5tq9pkj
237531
237530
2026-09-30T11:39:04Z
कल्पनाशक्ती
3813
237531
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''३५'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>म्हटल्या की शब्दांचे हाल करावे लागतात आणि ते केल्यास कवितावाचनाने होणाऱ्या आनन्दांत तितकी न्यूनता येते. थोडा शाब्दिक फेरफार केल्यास हा दोष निघून जातो, पहा:-
{{Block center|<poem>अेक मुलाने पहा बघितली
{{gap}}गुलाबकलिका बहु गुल्जार
तिला भुलुनिया धावत जवळी
{{gap}}गेला होअुनि लम्पट फार
गुलाबकलिका, गुलाबकलिका,
{{gap}}गुलाबकलिका बहारदार !</poem>}}
{{gap}}हें अधिक आनन्ददायक वाटतें; यापासून बान्धसूद सुबकपणा पाहिल्याचा आनन्द होती. पद्यरचना जितकी शिथिल तितकी ती स्वाभाविक असत असें मानणे चुकीचे आहे.

{{center|'''लयमुक्त स्वैरपद्य'''}}
{{gap}}परन्तु मराठींतील वृत्त, जाति वा छन्द यामध्ये प्रतिभेला मुक्त विलास करितां येत नाही या समजुतीने अिङ्ग्रजींतील मुक्तपद्याच्या (Free verse) धर्तीवर काही रचना सहेतुकपणे मराठीत होअू लागली आहे. गद्यातील शब्दांचा स्वाभाविक क्रम निष्कारण फिरवून, स्वैरपणानें त्याचे तुकडे तोडून, ते अेकाखाली अेक लिहून जें स्वरपद्य सिद्ध होतें तें अधिक स्वाभाविक कसें हें समजत नाही.
{{gap}} गोविन्दाग्रजांनी आपल्या वाग्वैजयन्तीची जी अर्पणपत्रिका लिहिली आहे ती स्वैरपद्याच्या दृष्टीने चिन्तनीय आहे.
{{block center/s}}
{{gap}}"सत्-चित्-हृत्-महत्-

आनन्द-पदवी-प्रदान-वदन्या ॥{{gap}}१

प्रीतीची पवित्रता, चिरन्तनाची चरित्रता,

{{gap}}सृष्टीची सचित्रता,

विश्वाची विविधता, अनन्ताची अगाधता,{{nop}}<noinclude>{{block center/e}}</noinclude>
ox08b3y6gvn8nrad4y4hf6tryppjofo
पान:छन्दोरचना.djvu/63
104
5779
237532
15566
2026-09-30T11:47:28Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237532
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''३६'''|}}
{{block center/s}}</noinclude>{{gap}}अिश्वराचें अस्तित्व

{{gap}}या सर्वांच्या

अचल अक्याची निदर्शना ॥{{gap}}२

भूतकालांतली भावजीवना, वर्तमानांतली वरतराशा,

{{gap}}भवितव्यांतली भाग्यदेवी ॥{{gap}}३

हृदयाची स्फूर्ति, अिच्छेची पूर्ति,

माङ्गल्याची कीर्ति ॥{{gap}}४

{{gap}}श्री हृदयशारदा

ही सर्वस्वाने अर्पिलेली

{{gap}}वाग्वैजयन्ती

सदैव कण्ठांत धारण करो ॥{{gap}}५
{{right|— गोविन्दाग्रज}}
{{block center/e}}
{{gap}}गोविन्दाग्रजांच्यावेळी स्वैरपद्याची चळवळ असती तर हें स्वैरपद्याचें विडम्बनच आहे असें वाटलें असतें.
{{gap}}यानन्तर १९३० च्या जानेवारीमध्ये लिहिलेली सुहृत्वम्पा कवीची अेक कविता 'साधना आणि अितर कविता' या सङ्ग्रहामध्ये प्रकाशित आहे. ही सहेतुकपण Free Verse म्हणून रचिलेली आहे.
{{Block center|<poem>"पुनरावृत्ति
{{gap}}कां अजुनी
{{gap}}{{gap}}लाजरें मुख ?
{{gap}}{{gap}}{{gap}}बघ इकडे- ("अं हं")-
{{gap}}{{gap}}{{gap}}दिव्य जणूं माधुर्यच विकसलें,
{{gap}}{{gap}}{{gap}}नाही मी हासणार मग झालें?
{{gap}}{{gap}}{{gap}}वद तर अेकदाच मधुबाले—
{{gap}}{{gap}}("मी नाही हं")-
{{gap}}"कित्ती सुरेख !"-
नच लाजुनी."
{{right|(साआअिक १०)}}</poem>}}{{nop}}<noinclude></noinclude>
qhwfmiji0flr1vjwlud2lo6somvsshp
पान:छन्दोरचना.djvu/64
104
5780
237533
15567
2026-09-30T11:56:05Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237533
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''३७'''|'''काही छन्दोविषयक प्रश्न'''}}</noinclude>{{gap}}हे कवि Free Verse ला 'सहज काव्य' म्हणतात; पण हें यांचे काव्य अितर कोणत्याहि कवितेइतकेंच सहज आहे! अशा रीतीचें लयमुक्त दिखाऊ स्वैर- पद्य हें गद्याहून मूलतः भिन्न, अधिक स्वाभाविक, सरस आणि सोयीचें कसें हें अद्यापि सिद्ध व्हावयाचें आहे.
{{gap}}अिङ्ग्रजी वाङ्मयांतील आधुनिक मुक्त पद्य (Free Verse) हें कसें असतें याची कल्पना यावी म्हणून E E. Cummings याची 'Sun set' ही कविता समग्र पुढे दिली आहे.
{{Block center|<poem>stinging
gold swarms
upon the spires
silver
{{gap}}chants the litanies the
great bells are ringing with rose
the lewd fat bells
{{gap}}and a tall
wind
is dragging
the
sea
with
dream
-S.</poem>}}
{{gap}}John Sparrow कृत Sense and Poetry या पुस्तकांत ११८ व्या पृष्ठावर या कवितेचें Robert Gravesने केलेलें स्पष्टीकरण आणि या पद्धतीचें समर्थन दिलेलें आहे, आणि पुढे त्या समर्थनाचा समाचारहि घेतलेला आहे.

{{center|'''लयबद्ध स्वैरपद्य'''}}
{{gap}}मुक्तपद्याचे अेक पुरस्कर्ते रा. आत्माराम रावजी देशपाण्डे यांना पद्यांत लयबद्धतेची आवश्यकता वाटते. तेव्हा लय अष्टमात्रक असल्यास मुक्तपद्य कसें रचितां येअील याचा विचार करण्यासाठी विठोबा अण्णा दप्तरदार यांचें पुढील पद्य घेअू.{{nop}}<noinclude></noinclude>
i5f49v234po6likmnbml0w810affb61
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/२
104
112371
237511
2026-09-30T04:47:37Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ निरगाठ - सुरगाठ डॉ. तारा भवाळकर आकांक्षा प्रकाशन, नागपूर"
237511
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
निरगाठ - सुरगाठ
डॉ. तारा भवाळकर
आकांक्षा
प्रकाशन, नागपूर<noinclude></noinclude>
9qb2nwch3eeg2wzfjn247olmnr2wua6
237512
237511
2026-09-30T04:52:45Z
JayashreeVI
4058
237512
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>

{{center|{{xxx-larger|'''निरगाठ - सुरगाठ'''}}}}

{{center|'''डॉ. तारा भवाळकर'''}}
{{center|{{larger|''आकांक्षा''}}}}
{{center|प्रकाशन, नागपूर}}<noinclude></noinclude>
6fu5w9bgm568jylftakvjv5jk80cz5h
237513
237512
2026-09-30T04:53:13Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237513
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>

{{center|{{xxx-larger|'''निरगाठ - सुरगाठ'''}}}}

{{center|'''डॉ. तारा भवाळकर'''}}
{{center|{{larger|''आकांक्षा''}}}}
{{center|प्रकाशन, नागपूर}}<noinclude></noinclude>
tlxs4e5vqfwl3u0pk6bby06nyipojlm
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/३
104
112372
237514
2026-09-30T04:55:18Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ निरगाठ सुरगाठ Nirgath-surgath तारा भवाळकर Dr. Tara Bhawalkar ३, स्नेहदीप, आंबेडकर मार्ग, सांगली. ((०२३३) २३७३३२६ प्रकाशन क्र. ८० प्रथमावृत्ती १५ ऑक्टो. २०१० प्रकाशक : अरुणा सबाने आकांक्षा प्रकाशन..."
237514
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
निरगाठ सुरगाठ Nirgath-surgath तारा भवाळकर
Dr. Tara Bhawalkar
३, स्नेहदीप,
आंबेडकर मार्ग, सांगली. ((०२३३) २३७३३२६
प्रकाशन क्र. ८०
प्रथमावृत्ती १५ ऑक्टो. २०१०
प्रकाशक : अरुणा सबाने
आकांक्षा प्रकाशन
ए-५०६, गणेश गौरी
अपार्ट., कोतवालनगर, नागपूर - १५
(०७१२) २२४७८८४,
९९७००९५५६२
email:
aruna-sabane@rediffmail.com
आयबीएन- ८९-९०३७१६-८-३
मुद्रक :
अंकुर एन्टरप्रायजेस,
अक्षरजुळवणी
संजय नेमाडे
मुखपृष्ठ : माधव लोखंडे
प्रा. पुरुषोत्तम माळोदे
नागपूर
किंमत : एकशे साठ रुपये<noinclude></noinclude>
o746u4p4dc5m7d5a17mcgmybgqzucfj
237515
237514
2026-09-30T05:00:03Z
JayashreeVI
4058
237515
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>

|निरगाठ-सुरगाठ
Nirgath-surgath
तारा भवाळकर

Dr. Tara Bhawalkar
३, स्नेहदीप,
आंबेडकर मार्ग, सांगली. ((०२३३) २३७३३२६
प्रकाशन क्र. ८०
प्रथमावृत्ती १५ ऑक्टो. २०१०
प्रकाशक : अरुणा सबाने
आकांक्षा प्रकाशन
ए-५०६, गणेश गौरी
अपार्ट., कोतवालनगर, नागपूर - १५
(०७१२) २२४७८८४,
९९७००९५५६२
email:
aruna-sabane@rediffmail.com
आयबीएन- ८९-९०३७१६-८-३
मुद्रक :
अंकुर एन्टरप्रायजेस,
अक्षरजुळवणी
संजय नेमाडे
मुखपृष्ठ : माधव लोखंडे
प्रा. पुरुषोत्तम माळोदे
नागपूर
किंमत : एकशे साठ रुपये<noinclude></noinclude>
4nll4e4dnhlll3s3l6txva4nb5299mp
237516
237515
2026-09-30T05:22:14Z
JayashreeVI
4058
237516
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>

|निरगाठ-सुरगाठ

||email:

|Nirgath-surgath || aruna-sabane@rediffmail.com

|- || आयबीएन- ८९-९०३७१६-८-३
|तारा भवाळकर || मुद्रक :

|Dr. Tara Bhawalkar || अंकुर एन्टरप्रायजेस,

|३, स्नेहदीप,|| अक्षरजुळवणी

|आंबेडकर मार्ग, सांगली. ((०२३३) २३७३३२६||संजय नेमाडे

|प्रकाशन क्र. ८० || मुखपृष्ठ :

|प्रथमावृत्ती १५ ऑक्टो. २०१० ||माधव लोखंडे

|प्रकाशक : अरुणा सबाने || प्रा. पुरुषोत्तम माळोदे

|आकांक्षा प्रकाशन || किंमत : एकशे साठ रुपये

|ए-५०६, गणेश गौरी

|अपार्ट., कोतवालनगर, नागपूर - १५

|(०७१२) २२४७८८४,

|९९७००९५५६२

<noinclude></noinclude>
8i2191aurh5wew42de0enkyha10hwiu
237517
237516
2026-09-30T05:26:30Z

27981nfgj8c32kef7gt2rvbxfjaxtcp
237518
237517
2026-09-30T05:26:58Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237518
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>

|निरगाठ-सुरगाठ

||email:

|Nirgath-surgath || aruna-sabane@rediffmail.com

|- || आयबीएन- ८९-९०३७१६-८-३
|तारा भवाळकर || मुद्रक :

|Dr. Tara Bhawalkar || अंकुर एन्टरप्रायजेस,

|३, स्नेहदीप,|| अक्षरजुळवणी

|आंबेडकर मार्ग, सांगली. ((०२३३) २३७३३२६||संजय नेमाडे

|प्रकाशन क्र. ८० || मुखपृष्ठ :

|प्रथमावृत्ती १५ ऑक्टो. २०१० ||माधव लोखंडे

|प्रकाशक : अरुणा सबाने || प्रा. पुरुषोत्तम माळोदे

|आकांक्षा प्रकाशन || किंमत : एकशे साठ रुपये

|ए-५०६, गणेश गौरी

|अपार्ट., कोतवालनगर, नागपूर - १५

|(०७१२) २२४७८८४,

|९९७००९५५६२

<noinclude></noinclude>
atgbrjvim4m9nz8av53kww5oh5dvsvn
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/४
104
112373
237519
2026-09-30T05:27:30Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ २१ व्या शतकात आपल्या अंतरोमींनी भरारी घेऊ पाहणाऱ्या, चि. सुमेधा, चि. शुभांगी चि. मंजिरी, चि. मीनल चि. नेहा, चि. विष्णुप्रिया आणि चि. आनंद या माझ्या लाडक्या भाचरांना - उदंड शुभेच..."
237519
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
२१ व्या शतकात आपल्या अंतरोमींनी भरारी घेऊ पाहणाऱ्या,
चि. सुमेधा, चि. शुभांगी
चि. मंजिरी, चि. मीनल
चि. नेहा, चि. विष्णुप्रिया
आणि
चि. आनंद या माझ्या लाडक्या भाचरांना

उदंड शुभेच्छांसह -
मावशी / आत्या<noinclude></noinclude>
l43h0xn5bxjl73d1pbh52jkpynas3ev
237520
237519
2026-09-30T05:36:07Z
JayashreeVI
4058
237520
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>

{{center|{{X-larger|'''२१ व्या शतकात आपल्या अंतरोमींनी
भरारी घेऊ पाहणाऱ्या,}}}}

{{crnter|{{xlarger|'''चि. सुमेधा, चि. शुभांगी'''

'''चि. मंजिरी, चि. मीनल'''

'''चि. नेहा, चि. विष्णुप्रिया'''

{{center|{{x-larger|'''आणि'''}}}}
{{center|{{-larger|'''चि. आनंद - या माझ्या लाडक्या भाचरांना'''}}}}
{{center|{{x-larger|'''उदंड शुभेच्छांसह -'''}}}}
{{right|{{x-larger|'''मावशी / आत्या'''}}}}<noinclude></noinclude>
jx7q1r7i09qterv9pshsnugzqrd18p2
237521
237520
2026-09-30T05:38:56Z
JayashreeVI
4058
237521
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>

{{center|{{X-larger|'''२१ व्या शतकात आपल्या अंतरोमींनी
भरारी घेऊ पाहणाऱ्या,}}}}

{{center|{{x-larger|'''चि. सुमेधा, चि. शुभांगी'''}}}}
{{center|{{x-larger'''चि. मंजिरी, चि. मीनल'''}}}}
{{center|{{x-larger'''चि. नेहा, चि. विष्णुप्रिया'''

{{center|{{x-larger|'''आणि'''}}}}
{{center|{{x-larger|'''चि. आनंद - या माझ्या लाडक्या भाचरांना'''}}}}
{{center|{{x-larger|'''उदंड शुभेच्छांसह -'''}}}}
{{right|{{x-larger|'''मावशी / आत्या'''}}}}<noinclude></noinclude>
84c6569er1yetcdjypu5fi71q6j3o72
237522
237521
2026-09-30T05:39:53Z
JayashreeVI
4058
237522
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>

{{center|{{X-larger|'''२१ व्या शतकात आपल्या अंतरोमींनी
भरारी घेऊ पाहणाऱ्या,}}}}

{{center|{{x-larger|'''चि. सुमेधा, चि. शुभांगी'''}}}}
{{center|{{x-larger|'''चि. मंजिरी, चि. मीनल'''}}}}
{{center|{{x-larger|'''चि. नेहा, चि. विष्णुप्रिया'''}}}}
{{center|{{x-larger|'''आणि'''}}}}
{{center|{{x-larger|'''चि. आनंद - या माझ्या लाडक्या भाचरांना'''}}}}
{{center|{{x-larger|'''उदंड शुभेच्छांसह -'''}}}}
{{right|{{x-larger|'''मावशी / आत्या'''}}}}<noinclude></noinclude>
i5gizfcr2hi7jhy7c3cfj495iontxx4
237523
237522
2026-09-30T05:41:00Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237523
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>

{{center|{{X-larger|'''२१ व्या शतकात आपल्या अंतरोमींनी
भरारी घेऊ पाहणाऱ्या,}}}}

{{center|{{x-larger|'''चि. सुमेधा, चि. शुभांगी'''}}}}
{{center|{{x-larger|'''चि. मंजिरी, चि. मीनल'''}}}}
{{center|{{x-larger|'''चि. नेहा, चि. विष्णुप्रिया'''}}}}
{{center|{{x-larger|'''आणि'''}}}}
{{center|{{x-larger|'''चि. आनंद - या माझ्या लाडक्या भाचरांना'''}}}}
{{center|{{x-larger|'''उदंड शुभेच्छांसह -'''}}}}
{{right|{{x-larger|'''मावशी / आत्या'''}}}}<noinclude></noinclude>
14pqrem8au4sk0ylf8yx6h8puddayso