विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:छन्दोरचना.djvu/८०
104
5335
237635
15086
2026-10-03T10:37:19Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237635
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||५३|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>जिवन्त कलाकृति पाहिजे. दागिन्यासाठी जातीचें सौन्दर्य विकृत करणें गर्ह्य आहे. यमकाच्या सोङ्गामुळे कित्येकदा नीरस पद्यच काव्याच्या नावावर खपतें. तेव्हा सयमक काव्य रचण्याचें सामर्थ्य अङ्गीं नाही म्हणून नव्हे तर खऱ्या काव्याची पारख व्हावी म्हणून निर्यमकच रचना करावी.
{{gap}}वस्तुतः यमकाचा प्रश्न गौण आहे. पक्षाभिनिवेशामुळेच या प्रश्नाला काही काळ अवास्तव महत्त्व आलें होतें. कविता ही आपण मुख्यत्वें करून सहानुभूतीच्या आनन्दासाठी वाचतो. चमत्कृतीची योग्य छटा कवितेंत असली तर ती आनन्दात भरच टाकते; परन्तु कृति जितकी सहज, सुबोध आणि स्वाभाविक वाटेल तितकी तिच्यांतील चमत्कृतीची छटा हृदयङ्गम वाटते.
{{Block center|<poem>"अनलसमीहित साधी राया वारा महीवरा कामा
अनलस मीहि तसा धीरा यावा रामही वराका मा" (मोरोपन्त)</poem>}}
{{gap}}यासारखी हठाकुष्ट क्लिष्टरचना पाहिली की केवळ विस्मय वाटतो. अशा दुर्योधरचनेंत रमणीयार्थ अत्यल्प येअू शकतो; आणि वर, कविता अर्थाकडे लक्ष देवून म्हणतांना चरणाचे जे विलक्षण तुकडे पडतात त्यांनी तर विरसच होतो. मणामणाच्या बेड्या पायांत घालून अेखादा बजरङ्ग विस्मयकारक अुड्या मारून दाखवील; परन्तु मेनकेचें पदलालित्य पहायचे असेल तर नूपुर चालतील; पण सुवर्णाचे असले तरी लङ्गर काय कामाचे? यमकाचें बन्धन हे तालाच्या बन्धनाप्रमाणे कृत्रिमता अुत्पन्न करितें; परन्तु ज्या मानाने चमत्काराचें स्तोम अुणावेल त्या मानाने बन्धनाची काचणी अुणावून कलाविलासास अधिक मोकळीक मिळेल.

{{center|{{x-larger|यमक अपरिहार्य नाही पण स्वाभाविक, आल्हाददायक आणि
अपयुक्त आहे.}}}}
{{gap}}यमक हे सामान्यपणे आल्हाददायक आहे; आणि सयमकरचनेकडे मनुष्यप्राण्याची थोडीफार स्वाभाविक प्रवृत्तीच आहे. 'आपडी थापडी गुळाची पापडी' यासारखे प्राचीन परम्परेने आलेले बाळबोल, आणि 'काखेत कळसा- गावाला वळसा' यासारख्या म्हणी पाहिल्या की यमक जुळविण्याची प्रवृत्ति किती स्वाभाविक आहे हे दिसून येतें. पद्याप्रमाणेच यमक हें स्मरणशक्तीस साह्य<noinclude></noinclude>
mqeb3nckuke93ic91n8nfivqbt0chtt
237636
237635
2026-10-03T10:37:42Z

{{center|{{x-larger|यमक अपरिहार्य नाही पण स्वाभाविक, आल्हाददायक आणि अपयुक्त आहे.}}}}
{{gap}}यमक हे सामान्यपणे आल्हाददायक आहे; आणि सयमकरचनेकडे मनुष्यप्राण्याची थोडीफार स्वाभाविक प्रवृत्तीच आहे. 'आपडी थापडी गुळाची पापडी' यासारखे प्राचीन परम्परेने आलेले बाळबोल, आणि 'काखेत कळसा- गावाला वळसा' यासारख्या म्हणी पाहिल्या की यमक जुळविण्याची प्रवृत्ति किती स्वाभाविक आहे हे दिसून येतें. पद्याप्रमाणेच यमक हें स्मरणशक्तीस साह्य<noinclude></noinclude>
cdwsryqvdyhtpsxnyscl4fru0xmjhmp
पान:छन्दोरचना.djvu/८२
104
5336
237638
15087
2026-10-03T10:53:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237638
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||५५|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>निर्यमक केलें होतें, तसा चूर्णिका नामक गद्यप्रकारांत यमकाचा प्रवेश गडकऱ्यांच्या पूर्वीच झाला होता. विनायक कोण्डदेव ओक यांनी हिन्दुस्थानकथारसाच्या शेवटी आपल्या अेका मित्राच्या गद्यग्रन्थांतून जो अुतारा दिला आहे तो केवळ यमकचमत्कार करून दाखविण्यासाठीच रचलेला दिसतो. वानगीसाठी पुढील अेक वाक्य पुरें होअील:-
{{gap}}"पहा पहा! गङ्गानदीपलीकडे त्या लुङ्गाहीन कङ्गालांनी सङ्गात्यांसह दङ्गा शिङ्गावर घेण्यांत अङ्गाकडे न पाहतां पिङ्गा घालून, ढङ्गाच्या रङ्गाने हङ्गाम समजून, झिङ्गा बरळतो त्यापरी अिङ्गा फिरला नव्हता तोपर्यंत चङ्गळ माण्डिली होती."

{{center|{{x-larger|यमकस्थान}}}}
{{gap}}पद्यांत यमक हे साधारणतः चरणान्तीं आणि लागोपाठ दोन वा अधिक चरणांच्या अन्तीं साधण्यांत येतें; कारण, चरणान्तीं विराम असतो आणि यमकाने चरण जणू काय अेकत्र बान्धले जातात. यमकाने प्रायः विषम-सम चरण बान्धले जातात; परन्तु केव्हा केव्हा यमक हे पहिल्या नि तिसऱ्या चरणांच्या अन्तीं आणि दुसऱ्या नि चौथ्या चरणांच्या अन्तीं साधण्यांत येते.
{{Block center|<poem>(१) "अन्तर्बहिःस्थित रघूत्तमसूनुधाकें
{{gap}}प्राणासि धैर्य तिळमात्र न होय जाया;
मोहान्धकारपतिता विधिच्या विपाकें
{{gap}}नेत्रे हळूच अुघडी रघुवीरजाया" (मोकुल ४।३६)

(२) "घनरवान्तकरा, खणतो पहा
{{gap}}वनबिडाल महीस कसे वनीं,
बहु भयङ्कर कर्कश हे महा,
{{gap}}परम सस्पृह मूषकसेवनीं. (मोकुल ४।२१)</poem>}}
{{gap}}जेथे रचना अर्धसम असते तेथे यमके याप्रमाणे जुळविणें बरें असतें. कित्येकदा यमक हे पहिल्या आणि तिसऱ्या चरणांच्या अन्तीं जुळवीत नाहीत, दुसऱ्या आणि चौथ्या चरणांच्या अन्तीं जुळवितात; जसें{{nop}}<noinclude></noinclude>
htzqchk8fbxaww557kva4dgvlq10j0c
237639
237638
2026-10-03T10:59:14Z

fvtq1dgqzxf6gnvx9neak67jpi22t1p
पान:छन्दोरचना.djvu/८३
104
5337
237640
15088
2026-10-03T11:12:27Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237640
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''५६'''|}}</noinclude>{{Block center|<poem>"तव पादसरोरुहीं स्वचित्त-
{{gap}}भ्रमरातें रस चाखवूनि गोवूं,
तुज भक्त तुझे सदैव गाती,
{{gap}}मृग आम्ही गुणगीतसक्त होवूं.” (मोस्फुका ४।१८३ )</poem>}}
{{gap}}गीतींत बहुशः यमक असेंच दुसऱ्या आणि चौथ्या पादांच्या अन्तीं साधलेलें असतें; परन्तु दोनदोन चरण सलग अका ओळींत देण्याच्या पद्धतीमुळे ही गोष्ट ध्यानांत येत नाही. गीतींत लागोपाठ चरणांच्या अन्तीं यमक जुळविल्याचीं अुदाहरणे दुर्मिळ आहेत.
{{Block center|<poem>"सोडुनि माझा घोडा
दोघेहि हस्त या क्षणीं जोडा.
'शरणागत', म्हणवा रे,
याचि अुपायें समर्थभय वारे". (मोकुल १३।१६)</poem>}}
{{gap}}वीरेश्वराने आपल्या गजमुखचरित्रांत यमकें अशींच जुळविली आहेत:-
{{Block center|<poem>"देअुनि निरोप अमरां
अुठला तो अीश जावया समरा;
त्या जगदवलम्बातें
दे नन्दी निजकरावलम्बातें." (वीगच ८)</poem>}}
{{gap}}आर्यागीतींत यमकें अशीं म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चरणांच्या अन्तीं साधिलेलीं रविकीर्तीच्या काळापासून आढळतात.
{{gap}}दोन वा क्वचित तीन चरणांहून अधिक चरण सोडून यमक साधूं नये. यमक केवळ डोळ्याला दिसून त्याचा तितका उपयोग नाही. तें कानाला कळलें पाहिजे. 'पूर्वानुभवसंस्कारबोधिनी यद्यदूरता,' हा दण्डीने अनुप्रासाच्या बाबती घातलेला दण्डक यमकाच्या बाबतींत अवश्य पाळायला हवा. दुसऱ्या जोडीदाराची गाठ पडेपर्यन्त पहिल्याचें स्मरण रहायला पाहिजे. चरण आखूड असल्यास पहिल्या आणि चौथ्या वा पांचव्या चरणांच्या अन्तीं यमक चालेल; परन्तु चरण दीर्घ असल्यास यमकांचाहि दूरान्वय होण्याची भीति असते. यशोधनांत् (पृ. ७६) शार्दूलविक्रीडितरचनेंत पहिल्या चरणाचें यमक आठव्य चरणाशी जुळविलें आहे!{{nop}}<noinclude></noinclude>
lsgt9i4hwmp8kd1jszgjzmoro9oxfat
पान:छन्दोरचना.djvu/८५
104
5338
237643
15089
2026-10-03T11:38:40Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237643
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''५८'''|}}
{{block center/s}}</noinclude>राही जयांचे यश शुभ्र येथे,

येतें जयांचे स्मरणे दृगम्बू." (तासक ४४)
{{block center/e}}
{{center|{{x-larger|यमकान्तीं खटका असतो}}}}
{{gap}}चरणान्तर्गत विरामामुळे जेथे चरणाचे दोन विभाग पडतात तेथे त्यांच्या अन्तीं (आणि काचित् केव्हा आरम्भी) यमक साधण्यांत येते. याचीं अुदाहरणे मागे (पृ ४९-५० पहा) दिलींच आहेत. आणखीहि अेकदोन अुदाहरणे घेअू
{{Block center|<poem>(१) "असेल सामर्थ्य तरीच चापीं
मौर्वीसि जोडा, विशिखासि सोडा
नसेल सामर्थ्य तथापि सारे
हस्तासि जोडा, मम बन्धु सोडा." (मोकुल ८।२७)
(२) "हे वो कोडे कोन निवाडे
अैस्या लक्षा काय विवक्षा
घेतो चापा स्पर्शुनि कोपा
चन्दीं दक्षा हेचि परीक्षा." (लस्व ५।३२)</poem>}}
{{gap}}येथे चरणान्तीं यमक न साधितां चरणविभागान्तीं साधिलें आहे. परन्तु अेवढ्यावरून चरणविभागाला चरण मानून चतुष्पदीची अष्टपदी करण्याचें प्रयोजन नाही. जेथे चरणाचे अशा रीतीने पडणारे दोन विभाग लगाक्रमदृष्टयाहि अभिन्न असतात तेथे मात्र चरणाची अद्पट करून चतुष्पदीची अष्टपदी करण्याकडे प्रवृत्ति होते; अुदाहरणार्थ

| त्या पुरीत सर्व लोक || {{gap}}जाहले अुदण्डशोक

| किन्तु तो न रामवीर|| {{gap}}जाउं दे स्वकीय धीर

| सर्व पौर कान्तिहीन|| {{gap}}जाहले अतीव दीन

| तो महान्त अन्तराय|| {{gap}}बोलवी जनांस 'हाय' !” (राप ५॥८४)

{{gap}}हा श्लोक निर्यमक चञ्चला [ । _ ‿ _ ‿ । _ ‿ _ ‿ । _ ‿ _ ‿ । _ ‿ _ ‿ ] वृत्ताचा आहे. परन्तु मध्यान्तिक यमक साधल्यामुळे प्रत्येक चरणाचे दोन अगदी
अेकसारखे तुकडे पडतात; आणि अेका श्लोकाचे पुढील प्रमाणे समानिकावृत्तांतील दोन सयमक श्लोक होतात{{nop}}<noinclude></noinclude>
a8yrdh1eqwdl828dobtg7n3omxzxwor
पान:छन्दोरचना.djvu/८६
104
5339
237644
15090
2026-10-03T11:45:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237644
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||५९|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>{{Block center|<poem>"त्या पुरींत सर्व लोक
जाहले अुदण्डशोक
किन्तु तो न रामवीर
जाउं दे स्वकीय धीर.
सर्व पौर कान्तिहीन
जाहले अतीव दीन
तो महान्त अन्तराय
बोलवी जनांस 'हाय'."</poem>}}
{{gap}}वृत्तांत अथवा जातींत सारख्या लगक्रमाचे शब्द जर सारख्या अन्तरांनी येअू शकत असतील तर तेथे चरणामध्येच यमकें साधून कवीस पदलालित्य दाखवावेसें वाटतें. आणि हीं यमकें तरङ्गावलीप्रमाणे आल्हाददायक होतात; जसें,
{{Block center|<poem>"तो शर गरधरवरसा, पविसा रविसा स्मरारिसायकसा" (मोरोपन्त)

"न धरी बा दर हा दर सादर दे वाजवूं पुन्हा नीट" (मोरोपन्त)</poem>}}
{{gap}}जातिरचनेंत विशेषतः अष्टमात्रक आवर्तनाच्या जातींत प्रत्येक आवर्तनांत तिसऱ्या मात्रेवर खण्डन करून तेथे यमकें साधतात; जसें,
{{center|"सुन्दरा मनामधि । भरलि जरा नहि । ठरलि हवेलिंत । शिरलि मोत्याचा । भाङ्ग"}}
{{gap}}यमकान्ती याप्रमाणे खटके हे असतात; तेथे थोडें थाम्बणें अवश्य असतें. तसें न केल्यास यमकांची प्रतीति कानास होत नाही. तेव्हा तसें करितांना शब्द भलत्या ठिकाणी तुटून रसभङ्ग होअू नये.
{{center|"वाजत गाजत साजत आज तया जतन करुनि आणा हो" (मोविप ४)

{{gap}}ही ओळ अर्थाकडे लक्ष देवून सरळ म्हटली असतां वाजत गाजत, साजत या तीनच शब्दांतील यमक प्रतीत होतें; आजत याजत या दोन अक्षरावलींतील यमक प्रतीत होत नाही; कारण, म्हणतांना आजत - याजत असे तुकडे न पडतां ते 'आज तया' आणि 'जतन' असे पडतात.
{{block center/s}}
'रामा, मनोज्ञगुणधामा, पलाशजनतामारणैकनिरता,

कामारिचित्तसदना, मारुतिप्रियसुनामा, नशत्रुविजिता,
<noinclude>{{block center/e}}</noinclude>
8ofh6vzthri4f31o0xhmhwcny5v0wtk
237645
237644
2026-10-03T11:46:26Z

3w7rhacxejjmm7wwgjgaf6l6dtacehf
पान:छन्दोरचना.djvu/८७
104
5340
237646
15091
2026-10-03T11:55:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237646
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''६०'''|}}
{{block center/s}}</noinclude>धामाधिपान्वयवरा, मानशौर्यसुभगा, मानिषेव्यचरणा,
वामाकृते, अितरवामापराङ्मुखमना, मानवैकशरणा." (मोकुल १३।३०)
{{block center/e}}
{{gap}}या श्लोकांत 'आमा' ची आवृत्ति साधिली परन्तु ती स्पष्टपणे प्रतीत होत नाही. यासाठी यमकान्तीं पदसमाप्ति होणें अवश्य आहे.

{{gap}}चरणान्तर्गत यमकावलीमुळे कित्येकदा वृत्ताची वा जातीची मोडणी कळायला साह्य होतें. अुदाहरणार्थ, सोळा गुरु अक्षरांच्या ब्रह्मरूपक नावाच्या वृत्ताचें वाणीभूषणांतील
{{Block center|<poem>"राजद्भालः स्फूर्जन्नेत्रप्रोद्यद्वह्निज्वालाजालैः
स्व... त्यम्भोवीचीनीरासारस्विद्यच्चूडाचन्द्रः ।
माद्यद्गौरीवक्त्राम्भोजस्वैरस्मैरक्रीडाशीतः
श्रेयो देयान्नागश्रेणीभूषामीषश्चन्द्रापीडः" (वाभू २।१८२)</poem>}}
{{gap}}हे अुदाहरण पाहतां वृत्ताची मोडणी [ ।_ _ _ _ ।_ _ _ _ ।_ _ _ _ ।_ _ _ _ ] अशी वाटते; परन्तु ज्या प्राकृतपैङ्गलावर वाणीभूषण आधारलेलें आहे त्यांतील,
{{Block center|<poem>"अुम्मत्ता जोहा अुट्ठे कोहा ओत्थाओत्थी जुज्झन्ता
मेणक्का रम्भा णाहं दम्भा अप्पाअप्पी बुज्झन्ता
धावन्ता सण्ठा छिण्णो कण्ठा मत्था पिट्ठी पेरन्ता
णं सग्गा मग्गा जाओ लग्गा लुद्धा अुद्धा हेरन्ता" (प्रापै २।१७५)</poem>}}
{{gap}}हे अुदाहरण पहातां वृत्ताची मोडणी [-।_ _ _ _।_ _ _ _।_ _ _ _।_ _ _ _ ] अशी पाहिजे हें निश्चित होतें.
{{gap}}चरणान्ती यमक साधितात म्हणून तेवढ्याने यमक हे चरणसमाप्तीचें गमक होत नाही. कित्येकदा लागोपाठ दोन आवर्तनान्ती यमक साधतात; कित्येकदा तें अेका चरणांत साधतात आणि दुसऱ्या चरणांत साधीत नाहीत. तेथे यमक हें केवळ पदलालित्याचें अेक अङ्ग असतें.
{{Block center|<poem>"मुखरमधीरं त्यज मञ्जीरं रिपुमिव केलिसुलोलम्
चल सखि कुञ्ज सतिमिरपुञ्जं शीलय नीलनिचोलम्" (गीगो ११।४)</poem>}}{{nop}}<noinclude></noinclude>
bqhaqkf6knbkz5mbohd0uivt62wjob1
237647
237646
2026-10-03T11:56:30Z

2zb6ltmbxtfh3034c1npjkripxzhwge
पान:छन्दोरचना.djvu/81
104
5797
237637
15584
2026-10-03T10:44:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237637
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''५४'''|}}</noinclude>करितें आणि पद्याअितकेच तें मनवळणीहि पडून जातें. काव्याची भाषा ही वास्तववादी, प्रत्यक्ष प्रखर सृष्टीची आठवण करून देखील अशी नसावी, ती गद्याच्या भाषेहून भिन्न, अद्भुतरम्यसूचक असावी असा जेव्हा आपला हेतु असतो तेव्हा यमक हें पद्याप्रमाणेच आपल्याला व्यवहाराच्या सहाऱ्यापासून दूर काव्याच्या काश्मीरात नेऊन सोडण्यास अुपयोगी पडतें. पद्याप्रमाणेच यमक हे कित्येकदा नवनवे वाक्प्रयोग आणि कल्पना सुचायला कारणीभूत होतें. पुन्हा काव्याची रचना जर पद्यांत करावयाची आहे तर कडव्याची विशिष्ट बान्धणी प्रतीत करून द्यायला यमक, चरणान्त्य यमक हे फार अुपयोगी पडतें. सुनीत म्हणजे केवळ साडेतीन श्लोक नव्हेत तर तें अष्टपदी नि षट्पदी, अथवा तीन चतुष्पद्या आणि त्यांची अेकत्र बान्धणी करणारी अन्त्य द्विपदी मिळून होतें याची जाणीव करून द्यायला यमकाच्या बान्धणीचा चांगला अुपयोग होतो.
{{gap}}तथापि सयमक पद्य म्हणजे काव्य हे समीकरण कोणत्याहि रसिकास मान्य होणार नाही. 'औडक चौडक दामाडू, दामाडूचे पञ्चाडू' अशा सयमक आणि पद्यरूप तथापि निरर्थक बाळबोलांनी बाळांनाच आनन्द व्हायचा. समञ्जस मनुष्याला यांत काहीच हृद्गम्य वाटणार नाही. तरी यमकाच्या चमत्कृतीने दिपून नीरस पद्यालाच काव्य म्हणून कवळणारे आणि सरस काव्याला निर्यमक म्हणून झिडकारणारे काही विद्वान् आढळतात. त्यांच्या डोळ्यांना आणि कानांना यमकाची जितकी सवय झालेली असते की मराठी निर्यमक काव्य पहाताक्षणी ते बुजतात. यमक हे आज मराठी कवितेचें सौभाग्यचिन्ह होअून बसले असलें तरी तें साक्षात् सौभाग्य नव्हे हे विसरतां कामा नये. तें अपरिहार्य नाही आणि त्याची शोभाहि सापेक्ष आहे.
{{gap}}सयमक रचना करावी की नाही हा प्रश्न जसा वैयक्तिक प्रकृतीचा तसाच सामाजिक रूढीचा आणि अभिरुचीचा आहे. संस्कृतांत बाणाच्या गद्यरूप कादम्बरीसहि काव्य मानतात, आणि पद्य हें प्रायः निर्यमक असतें; फार्सीभाषेत गद्यसुद्धा सयमक रचण्याकडे शेकडों वर्षे प्रवृत्ति होती. रेन्दाळकरांनी निर्यमक पद्य रचण्यांत संस्कृत वाङ्मयांतील रूढीकडे परावर्तन केलें; राम गणेश गडकरी यांनी राजसंन्यासांतील सयमक गद्य लिहिण्यांत अुर्दू नाटकांतील पद्धतीचें अनुकरण केलें. यमकचतुर मोरोपन्ताने भगवद्गीतेचें भाषान्तर जसें पूर्वीच<noinclude></noinclude>
5t801r7b2fu0zxf8c9epg0xjjliuzhr
पान:छन्दोरचना.djvu/84
104
5800
237641
15587
2026-10-03T11:22:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237641
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||५७|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>{{gap}}यमक हे जसें विरामापूर्वी म्हणजे चरणान्ती साधण्यांत येतें तसेंच तें चरणारम्भीहि साधतात.
{{Block center|<poem>(१) "पम्पातीरीं मग वसे
{{gap}}शम्पाशतरुचिचाप
सम्पाया धृति विरह दे
{{gap}}कम्पा अुठवुनि ताप." (मोदोरा ३७)
(२) "शङ्का हरुनी विभीषणा
{{gap}}रङ्का सङ्गरधीर
पङ्कापगुणसिन्धु दे
{{gap}}लङ्का श्रीरघुवीर." (मोदोरा ६५)
(३) "वन्देऽहं विठ्ठलं दातुं
शं देहं धृतवान्प्रभुः
संदेहं हन्त मुदितो
मन्देहं योऽशुमानिव." (मोस्फुका १।१३६)
(४) "पङ्कराशिमपि पावनकीते
रङ्कराजमव मां करुणाब्धे
शङ्करानतमलं तव कर्तुं
कं कराब्जमनघं न सदीड्यम् ” (मोस्फुका १।१८३)</poem>}}
{{gap}}पुढील दोन अुदाहरणांत अनुक्रम आद्यन्तिक आणि अन्तादिक यमक आहे असें म्हणतात; पण वस्तुतः हीं अनेकाक्षरावृत्तीचीं अुदाहरणे आहेत.
{{block center/s}}
(१) "शोक लास्य करी हृदङ्गणिं, कण्ठ केवळ शोकला,

कोमलाननपूर्णचन्द्र तिचा तदा बहु कोमला;

कां पती रुसला? म्हणे, सकलेन्द्रियें बहु कांपती,

भार तीस निजाङ्ग होय, वदे अशी मग भारती." (मोकुल ४।७१)

२ ) "तेची चिरञ्जीव जगीं जहाले

हाले जयांचे स्मरणें धरा ही,
<noinclude>{{block center/e}}</noinclude>
j2t7lh9rho07qhez14cvw16j4apr5zm
237642
237641
2026-10-03T11:23:22Z
कल्पनाशक्ती
3813
237642
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||५७|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>{{gap}}यमक हे जसें विरामापूर्वी म्हणजे चरणान्ती साधण्यांत येतें तसेंच तें चरणारम्भीहि साधतात.
{{Block center|<poem>(१) "पम्पातीरीं मग वसे
{{gap}}शम्पाशतरुचिचाप
सम्पाया धृति विरह दे
{{gap}}कम्पा अुठवुनि ताप." (मोदोरा ३७)
(२) "शङ्का हरुनी विभीषणा
{{gap}}रङ्का सङ्गरधीर
पङ्कापगुणसिन्धु दे
{{gap}}लङ्का श्रीरघुवीर." (मोदोरा ६५)
(३) "वन्देऽहं विठ्ठलं दातुं
शं देहं धृतवान्प्रभुः
संदेहं हन्त मुदितो
मन्देहं योऽशुमानिव." (मोस्फुका १।१३६)
(४) "पङ्कराशिमपि पावनकीते
रङ्कराजमव मां करुणाब्धे
शङ्करानतमलं तव कर्तुं
कं कराब्जमनघं न सदीड्यम् ” (मोस्फुका १।१८३)</poem>}}
{{gap}}पुढील दोन अुदाहरणांत अनुक्रम आद्यन्तिक आणि अन्तादिक यमक आहे असें म्हणतात; पण वस्तुतः हीं अनेकाक्षरावृत्तीचीं अुदाहरणे आहेत.
{{Block center|<poem>(१) "शोक लास्य करी हृदङ्गणिं, कण्ठ केवळ शोकला,
कोमलाननपूर्णचन्द्र तिचा तदा बहु कोमला;
कां पती रुसला? म्हणे, सकलेन्द्रियें बहु कांपती,
भार तीस निजाङ्ग होय, वदे अशी मग भारती." (मोकुल ४।७१)</poem>}}
{{block center/s}}
(२) "तेची चिरञ्जीव जगीं जहाले

हाले जयांचे स्मरणें धरा ही,
<noinclude>{{block center/e}}</noinclude>
trjit78dw4u5920bez9f8wg9xnm1zej
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/२२
104
112401
237633
237609
2026-10-02T12:01:53Z
JayashreeVI
4058
237633
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>मानसिक ताण पावसाच्या शिडकाव्याने सेेल झाले, शेतं हिरवी झाली, कणसं भरली, धान्याच्या राशी खळ्यात आल्या की ताणमुक्तीच्या आनंदाने बेहोश होऊन लोकगीतं, नृत्य रंगू लागतात. निसर्गाने साथ दिली की वर्षभराची चिंता दूर होते आणि त्याचा आविष्कार गीत, नृत्य, यात्रा, जत्रा, क्रीडा, स्पर्धा, नटणं- थटणं अशा अनेक अंगांनी होत राहतो. अशावेळी कविवर्य केशवसुतांची एका कवितेची ओळ हटकून आठवते-
{{gap}}''"गाण्याने श्रम वाटतात हलके। हेही नसे थोडके ॥"''

{{gap}}श्रम शरीराचेही असतात, मनाचेही असतात, नुसतेच शारीरिक श्रम करीत राहिले तर शीण, थकवा वाढतो. म्हणून आपल्या पारंपरिक जीवनशैलीत कामाबरोबर गाणं येतं. आता शेतीकामातही खूप यंत्रे आली आहेत; पण जेव्हा बैलांचे नांगर, मोटा होत्या, कापणी मळणी माणसांनाच मेहनत घेऊन करायला लागायची तेव्हा मोटेची गाणी, भलरीची गाणी गात गात शेतकरी श्रम हलके करीत असे. "गाता गळा आणि शिंपता मळा" ही माणसाच्या सुखाची परमावधी असते.

{{gap}}बायकांची तर पारंपरिक सगळीच कामं शारीरिक कष्टाची! दळणकांडण, धुणी-भांडी, बाळाला जोजवणं-झोपवणं, सडा-सारवण, शिवाय शेतातली कामं आणि वर घरात सासुरवास असला तर तो ताण! अशावेळी प्रत्येक काम करताना गाणं गात, ओव्या गात आपले शारीरिक मानसिक ताण हलके करण्याचा प्रयत्न बाई करीत आली आहे.

{{gap}}''"गाण्याच्या नादात तुला ओढिते दगड।"''

{{gap}}म्हणत दळताना जात्याच्या दगडाशीच ती बोलत राही, तर कधी
{{gap}}''"जात्या तू ईसवरा (ईश्वरा) नको मला जड जाऊ ॥"''
{{gap}} म्हणून जात्याचीच विनवणी करीत असे.

{{gap}}हादग्या-भोंडल्याच्या गाण्यातून सासरच्या माणसांवर "झिप्र कुत्रं सोडा ग बाई" असं हसत हसत सांगत प्रत्यक्षातल्या सासुरवासाच्या कडक आधणात गाण्याचं विसण घालीत राही. प्रत्यक्षात सासरच्या माणसांपुढे मान वर करून पहायची हिंमत नसे. अशावेळी खेळातल्या गाण्यांतून, म्हणी उखाण्यांतून आपलं मन मोकळं करण्याच्या बाईच्या दृष्टीने मनात साठलेल्या ताणांचं हे एकप्रकारे विरेचन (ॲरिस्टॉटलच्या भाषेत 'कॅथॉर्सिस') असे.

{{gap}}नृत्य, नाट्य, गीत या सर्वच कला माणसांचे शरीर, मानसिक ताण हलके करण्यासाठी असल्याची उद्दिष्टे 'नाट्यवेद' निर्माण करणाऱ्या 'भरतमुनी' नेच सांगून ठेवली आहे. नाटकाच्या निर्मितीचा हेतू सांगताना भरतमुनी म्हणतात-<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / २१}}</noinclude>
3um97ivq0g3w6fbrljez1oceqqq1um6
237634
237633
2026-10-02T12:02:36Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237634
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>मानसिक ताण पावसाच्या शिडकाव्याने सेेल झाले, शेतं हिरवी झाली, कणसं भरली, धान्याच्या राशी खळ्यात आल्या की ताणमुक्तीच्या आनंदाने बेहोश होऊन लोकगीतं, नृत्य रंगू लागतात. निसर्गाने साथ दिली की वर्षभराची चिंता दूर होते आणि त्याचा आविष्कार गीत, नृत्य, यात्रा, जत्रा, क्रीडा, स्पर्धा, नटणं- थटणं अशा अनेक अंगांनी होत राहतो. अशावेळी कविवर्य केशवसुतांची एका कवितेची ओळ हटकून आठवते-
{{gap}}''"गाण्याने श्रम वाटतात हलके। हेही नसे थोडके ॥"''

{{gap}}श्रम शरीराचेही असतात, मनाचेही असतात, नुसतेच शारीरिक श्रम करीत राहिले तर शीण, थकवा वाढतो. म्हणून आपल्या पारंपरिक जीवनशैलीत कामाबरोबर गाणं येतं. आता शेतीकामातही खूप यंत्रे आली आहेत; पण जेव्हा बैलांचे नांगर, मोटा होत्या, कापणी मळणी माणसांनाच मेहनत घेऊन करायला लागायची तेव्हा मोटेची गाणी, भलरीची गाणी गात गात शेतकरी श्रम हलके करीत असे. "गाता गळा आणि शिंपता मळा" ही माणसाच्या सुखाची परमावधी असते.

{{gap}}बायकांची तर पारंपरिक सगळीच कामं शारीरिक कष्टाची! दळणकांडण, धुणी-भांडी, बाळाला जोजवणं-झोपवणं, सडा-सारवण, शिवाय शेतातली कामं आणि वर घरात सासुरवास असला तर तो ताण! अशावेळी प्रत्येक काम करताना गाणं गात, ओव्या गात आपले शारीरिक मानसिक ताण हलके करण्याचा प्रयत्न बाई करीत आली आहे.

{{gap}}''"गाण्याच्या नादात तुला ओढिते दगड।"''

{{gap}}म्हणत दळताना जात्याच्या दगडाशीच ती बोलत राही, तर कधी
{{gap}}''"जात्या तू ईसवरा (ईश्वरा) नको मला जड जाऊ ॥"''
{{gap}} म्हणून जात्याचीच विनवणी करीत असे.

{{gap}}हादग्या-भोंडल्याच्या गाण्यातून सासरच्या माणसांवर "झिप्र कुत्रं सोडा ग बाई" असं हसत हसत सांगत प्रत्यक्षातल्या सासुरवासाच्या कडक आधणात गाण्याचं विसण घालीत राही. प्रत्यक्षात सासरच्या माणसांपुढे मान वर करून पहायची हिंमत नसे. अशावेळी खेळातल्या गाण्यांतून, म्हणी उखाण्यांतून आपलं मन मोकळं करण्याच्या बाईच्या दृष्टीने मनात साठलेल्या ताणांचं हे एकप्रकारे विरेचन (ॲरिस्टॉटलच्या भाषेत 'कॅथॉर्सिस') असे.

{{gap}}नृत्य, नाट्य, गीत या सर्वच कला माणसांचे शरीर, मानसिक ताण हलके करण्यासाठी असल्याची उद्दिष्टे 'नाट्यवेद' निर्माण करणाऱ्या 'भरतमुनी' नेच सांगून ठेवली आहे. नाटकाच्या निर्मितीचा हेतू सांगताना भरतमुनी म्हणतात-<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / २१}}</noinclude>
ayyruuegyskcz249m26gz6qkj878wyb