विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.22
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
पान:छन्दोरचना.djvu/८८
104
5319
237648
15068
2026-10-04T05:55:34Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237648
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||६१|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>{{gap}}हे साकीचे दोन चरण आहेत. या द्विपदीची यमकानुरोधाने,
{{Block center|<poem>"मुखरमधीरम्
त्यज मञ्जीरम्
{{gap}}रिपुमिव केलि सुलोलम्
चल सखि कुञ्जम्
सतिमिरपुञ्जम्
{{gap}}शीलय नीलनिचोलम्"</poem>}}
{{gap}}अशी षट्पदी करणें युक्त होणार नाही. यमकानुरोधाने चरणनिर्णय केल्यास "वाचाळ मी नीट पाचारितों धीट त्याचा न यो वीट साचा हरी" या अेक चरणाचे
{{Block center|<poem>"वाचा-
{{gap}}ळ मी नीट
पाचा-
{{gap}}रितों धीट
त्याचा
{{gap}}न यो वीट
साचा
{{gap}}हरी"</poem>}}
असे आठ तुकडे पडून हें विलक्षण पद्य होअील !

{{center|{{x-larger|यमक कसें असावें?}}}}
{{gap}}काव्याच्या सरस स्वाभाविकतेला जपायचे असेल तर यमक हे अेकदोनाहून अधिक अक्षरांचें असण्याचें प्रयोजन नाही. यमक प्रत्ययात्मक नसावें. "रामाचें - देवाचें" हे यमक योग्य नाही; "घे वाचे - देवाचे" हे यमक चालेल. यमकाच्या पुनरावृत्त भागांतील व्यञ्जनोच्चार अभिन्न नसले तर ते स्वर्गीय, निदान अेकमेकाशी जुळते असे असावेत. टाक-लाख, दासी-खाशी, पुढे-मुदे, केश-वेष, भाल-आळ अशीं यमकें शुद्ध आणि अुत्तम अर्थातच नाहीत; पण तीं धकतील. त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचें कारण नाही.{{nop}}<noinclude></noinclude>
s9iwiodab71jtr5vg7ew557ggkisf0h
पान:छन्दोरचना.djvu/८९
104
5341
237649
15092
2026-10-04T06:02:15Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237649
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''६२'''|}}</noinclude>{{center|{{x-larger|मराठीतील यमकोपयोगाचा अितिहास}}}}
{{gap}}मराठीत चरणान्त्य यमक हे अपभ्रंशवाङ्मयाच्या द्वारा आले असलें पाहिजे. तथापि मराठीतील आद्य वृत्तात्मक रचना, भास्करकविकृत 'अीशस्तुति' ही निर्यमक आहे. तेराव्या शतकाच्या शेवटीं शेवटीं सयमक रचनेचा पाठच पडला. परन्तु अनेकदा शुद्ध यमकाचें काम केवळ अक्षरावृत्तीवर भागवून घेण्यांत येअी. ओवीरचनेत असें सदोष यमक आहे. अेकनाथाचीं पदें सयमक आहेत. मुक्तेश्वराच्या रामायणाची वृत्तरचना ही सयमकच आहे. वामनापासून यमकाला विशेष महत्त्व येअू लागलें; तो निर्वाळा असा देतो कीं,
{{Block center|<poem>"श्लोकवृत्त कथिलें यमकांनी
गाति त्यांस न पडे यम कानीं" (वाभारा १।३०)</poem>}}
{{gap}}त्याच्या चमत्कृतिजनक थोर कामगिरीमुळेच त्याचें नाव 'यमक्या' पडलें. मोरोपन्ताच्या कृतींत या चमत्कृतीचा कळस झाला. चरणान्तीं शक्य तितक्या अक्षरांची यमके तर त्याने साधिलींच, पण साहित्यकारांनी शब्दालङ्कारप्रकरणीं जितक्या प्रकारची यमकें सागितलीं आहेत तितक्या प्रकारचीं जुळवून मोरोपन्ताने वाचकांचे डोळे दिपवून टाकिले, त्यांची मति भ्रान्त करून टाकिली. तथापि त्याचें भगवद्गीतेचें भाषान्तर निर्यमक गीतींत आहे हे विसरता कामा नये. जातिरचनेला यमक हे प्राचीन काळापासून आवश्यक वाटत आले आहे. आधुनिक मराठी कवींत घण्टय्या नायडू यांनी आपले अेक दीर्घ काव्य निर्यमक लिहिले असले तरी निर्यमक कवितेची चळवळ अेकनाथ पाण्डुरङ्ग रेन्दाळकर यांनीच केली. रा. अेकनाथ यादव निफाडकर यांचें 'सतीचा शाप' हें दीर्घ जातिस्वरूप काव्य निर्यमकच आहे. तरी आधुनिक मराठी कविता ही प्रायः सयमकच आहे. शक्य तितक्या अक्षरांची यमकें हट्टाने जुळवीत बसण्यांत बुद्धीचा व्यय मात्र क्वचितच कोणी कवि करीत असेल. यमक अेकाक्षरी असलें तरी धकतें. अेकाक्षरी यमक जुळविणें हें पद्यरचनेहून अधिक दुष्कर वा कृत्रिम सुतराम् नाही. तथापि रेन्दाळकरांच्या मागून निर्यमक कवितेचा पुरस्कार करण्याची आवश्यकता अलीकडे पूर्व महाराष्ट्रांतील कवींना वाटू लागली आहे. त्यांच्यापैकी काही जणांना तर लयबद्धताहि जाचक होते. त्यांनी यमकाची प्रतिष्ठा कां ठेवावी?{{nop}}<noinclude></noinclude>
mftpspdeoiiipls88krblztsiap5phh
पान:छन्दोरचना.djvu/९०
104
5342
237650
15093
2026-10-04T06:12:42Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237650
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh||'''६३'''|'''यमक, यति, अक्षर आणि गण'''}}</noinclude>{{center|{{x-larger|२ यतिविचार}}}}
{{gap}}पद्य सलगपणे आणि लयानुरोधाने वाचीत असतांना जो न्यूनाधिक विराम काही ठिकाणी घ्यावाच लागतो त्याला '''यति''' म्हणतात. हा यति ज्या ठिकाणी व्यावयाचा त्या 'जिह्वेष्टविश्रामस्थाना'लाहि '''यति''' म्हणतात. यतिस्थानी पद्याचा विच्छेद होतो, तुकडा पडतो; म्हणून यतिस्थानीं शब्दसमाप्ति, निदान पदसमाप्ति तरी व्हावी. तसें न झाल्यास जो कर्णकटु दोष होतो त्याला यतिभङ्ग म्हणतात. यति मानावा की नाही याविषयी मतभेद आहे असें दिसतें.
{{Block center|<poem>"जयदेअपिङ्गला सक्कअम्मि दोच्चिअ जअि समिच्छन्ति ।
मण्डव्व, भरह, कासव, सेवल (? यव) पमुहा ण अिच्छन्ति" ॥ (स्वछ १।१४४)</poem>}}
{{gap}}पिङ्गल आणि जयदेव हे यति मानतात तर माण्डव्य, भरत, काश्यप, आणि सैतव हे मानीत नाहीत. याचा अर्थ, पद्यरचनेंत यति येअूच शकत नाही असा नव्हे, तर यति हा पद्य म्हणणाऱ्याच्या पद्धतीवर अवलम्बून असल्यामुळे त्याचें स्थान हे निश्चित मानीत नसत अेवढाच केला पाहिजे. ही अनिश्चिति चरणान्तर्गत यतीविषयी असली पाहिजे; कारण "यतिः सर्वत्र पादान्ते श्लोकार्धेतु विशेषतः" असें परम्पराप्राप्त वचन आहे. चरणान्तीं यति हा निरपवादपणें असलाच पाहिजे; कारण, पद्याचे चरणरूपी विभाग हे या अपरिहार्य यतीच्याच अनुरोधाने पडतात.
{{Block center|<poem>"लाविला गुलाबी रङ्ग
किति सुन्दर अमुच्या बङ्ग-{{gap}}ल्याप्रती!
मोगरी, चमेली, कुन्द
लाविलीं चहुकडे सुन्द-{{gap}}राकृती.
गुञ्जतात गुङ्गुङ् भृङ्ग;
तो नाद तयांचा गुङ्ग-{{gap}}वीमती.” (पोप ५७)</poem>}}
यासारखीं हास्योत्पादक<ref>परन्तु
{{Block center|<poem>"प्रभूतें म्हणे, हे पहा आङ्ग, लीला-
वती मी, वरावें मला चाङ्गलीला"(मोसीरा ४०)</poem>}}
हे हास्योत्पादक नाही, हास्यास्पद आहे.</ref> पद्ये सोडली तर चरणान्तीं शब्दसमाप्ति न होण्याचा<noinclude>
{{reflist}}</noinclude>
ly3k4ftsuc5m9n9kw9ruladu08l0al7
पान:छन्दोरचना.djvu/९१
104
5343
237651
15094
2026-10-04T06:24:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
237651
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{right|पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने}}
{{rh|'''छन्दोरचना'''|'''६४'''|}}</noinclude>प्रश्नच सम्भवत नाही. अुलटपक्षी चरणान्तीं विराम घ्यायला पाहिजे तो न घेतां पुढील चरणांत जेथे यति नाही तेथे तो अर्थाच्या सोयीसाठी घेतल्यास तें कर्णकटु नि वैरस्यकारक होतें. पहा:-
{{Block center|<poem>"लीलेने स्वकरांत तो धरितसे काण्डी बरूची जधी
साऱ्या सुन्दर वस्तु त्या झडकरी येती समाधीमधी
त्याच्या; येअुनि त्या तयास म्हणती, 'आम्हास दे भूषण
दिव्यें, आणि शिकीव लौकर अम्हां तीं अप्सरोगायनें'" (केक. ८०)</poem>}}
{{gap}}चरणान्तर्गत यति मानावयाचा की नाही, मानावयाचा झाल्यास त्याचें स्थान कोणतें अित्यादि गोष्टीविषयी मतभेद सम्भवतो. अनुष्टुभ्, बृहती आणि पङ्क्ति या वर्गातील वृत्तांत पिङ्गलाने यति सागितला नसला तरी हलायुध असा आम्नाय आहे म्हणून यति साङ्गतो. अिन्द्रवज्रा, अुपेन्द्रवज्रा या अकरा-अक्षरी वृत्तांत पिङ्गल यति साङ्गत नाही, पण शालिनी या अकराच अक्षराच्या वृत्तांत तो यति साङ्गतो. मन्दारमरन्दचम्पूचा कर्ता श्रीकृष्ण कवि हा अिन्द्रवज्रा- अुपेन्द्रवज्रा वृत्तांत पांचव्या अक्षरानन्तर यति साङ्गतो.
{{gap}}कानडी छन्दोऽम्बुधीचा कर्ता नागवर्मा हा स्वतन्त्रपणें यति सागतो. शालिनीवृत्तांत तो यति [_ _ _ _ _ ‿ _ ! _ ‿ _ _] सातव्या अक्षरानन्तर साङ्गतो; रथोद्धतेत [ _ ‿ _ ‿ ‿ ‿ ! _ ‿ _ ‿ _ ] सहाव्या अक्षरानन्तर, अिन्द्रवज्रावृत्तांत [ _ _ ‿ _ _ ‿ ‿ _! ‿ _ _ ] आठव्या अक्षरानन्तर यति साङ्गतो. नागवर्म्याने साङ्गितलेले काही यति स्वाभाविक वाटतात तर काही कृत्रिम वाटतात. शशिकला, स्रुक् इत्यादि अप्रचलित वृत्तांची मोडणी कळून त्यांना चाल लावायला साङ्गितलेल्या यतिस्थानांचें साह्य होतें. परन्तु कोकिलक, नर्कुटक अित्यादि काही वृत्तांना चाल लावतांना यतीची अुलट अडचण होते.
{{gap}}शालिनी, पृथ्वी, शार्दूलविक्रीडित अित्यादि वृत्तांच्या चाली परम्परेने चालत आल्या असून जिवन्त राहिल्या आहेत, त्यांच्या यतिस्थानाविषयी बहुशः मतभेद होत नाही.
{{gap}}यतिभेदाने वृत्तभेद होतो. अवितथ, कोकिलक, आणि नर्कुटक वा शशिकला, स्रक् आणि मणिगुणनिकर हे भेद यतिभेदाने होतात.{{nop}}<noinclude></noinclude>
iuuatd4ii3k787gg0rxs58w9n0zon2f
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/२३
104
112414
237652
2026-10-04T11:41:22Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ "दुःखार्तानां श्रमार्तानां, शोकार्तानां तपस्विनाम् विश्राम जननं लोके, नाट्यमेतद् मया कृतम् ।।" - दुःखी, श्रमिक, शोकग्रस्त आणि तपस्वी या सर्वांच्या मनाला विसावा मिळावा (आ..."
237652
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
"दुःखार्तानां श्रमार्तानां, शोकार्तानां तपस्विनाम्
विश्राम जननं लोके, नाट्यमेतद् मया कृतम् ।।"

दुःखी, श्रमिक, शोकग्रस्त आणि तपस्वी या सर्वांच्या मनाला विसावा मिळावा (आणि पुन्हा प्रपंचातले टक्के टोणपे खाण्यासाठी ताजेतवाने होता यावे) म्हणून मी नाटक निर्माण केले, असा निर्वाळा नाट्यशास्त्रकर्त्यानेच दिला आहे. नाटक म्हणजे अनेक कलांचे संगमतीर्थ !
दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शारीरिक आणि मानसिक श्रम घ्यावेच लागतात. कधी कधी त्यांचा अतिरेक होतो. मग ताण वाढत जातात. अशावेळी कला आणि क्रीडा यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृतिशील सहभाग हा फार निरामय उतारा आहे.
प्रत्येक व्यक्तीजवळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची कल्पकता, नवसर्जनशीलता असते, आपल्या ऐहिक गरजांसाठी ती वापरली जातेच. पण जेव्हा व्यावहारिक लाभ हानीची गणितं ओलांडून तिचा उपयोग होतो तेव्हा जे निर्माण होतं तीच कला! त्यातून मिळणारा आनंद हा कलात्मक आनंद! ज्या आनंदाला व्यावहारिकतेची कुंपणं नसतात; नसावीत. असा एक कोपरा सुबुद्ध माणसाने प्रयत्नपूर्वक जतन करायला हवा. प्रपंचाच्या ऐन धकाधकीतही त्याच्यासाठी शक्ती आणि वेळ ठेवावा. मग 'ताणमुक्तीच्या' नावाखाली 'बिझिनेस पार्टी'च्या नावाखाली इतर मादक द्रव्यांच्या सेवनाची गरज रहात नाही. आपण काहीतरी आनंददायी निर्माण करू शकतो ही धुंदी पुरेशी ठरते; पण त्यासाठी त्या कलानिर्मितीत प्रत्यक्ष सहभाग हवा. केवळ दुसऱ्यांची गाणी ऐकून, टेपरेकार्डस् ऐकून, नाटके सिनेमे पाहून किंवा तत्सम अप्रत्यक्ष कलास्वाद हा एक प्रकारे माणसाला निष्क्रीय करतो. हे सर्व करताना स्वतः ही गाण्याची लकेर आपल्यापुरती आपल्यासाठीच निर्हेतुक छेडीत रहावी. आपण आपल्यासाठीच नृत्याच्या ताल- लयीत कधीतरी झोकून द्यावं, आपण आपल्यासाठीच रंगांचे चार फटकारे कागदावर ओढावेत आणि आपल्याला अभिव्यक्त करीत रहावं. थोडक्यात म्हणजे
"गाना आये ना आये गाना चाहिये ।"
तो आनंदाच्या मुळीचा झरा आहे. जीवनातले ढळते तोल सावरण्यासाठी आपल्याच रक्तातला आदिताल सर्वात प्रभावी उतारा आहे. त्यालाच कला म्हणायचं, दुसरं काय ?
आपण सगळे तानसेन होऊ शकत नाही पण 'कानसेन' तर होऊ शकतो आणि 'बाथरूम सिंगर' तर असतोच असतो. तो गाता गळा एरव्हीही वाहता गाना आया ना आये... / २२<noinclude></noinclude>
d5t2gnmnshcu5spw6julkqks6sjv6ev
237655
237652
2026-10-04T11:52:29Z
JayashreeVI
4058
237655
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{block center|<poem>''"दुःखार्तानां श्रमार्तानां, शोकार्तानां तपस्विनाम्
विश्राम जननं लोके, नाट्यमेतद् मया कृतम् ।।"''</poem>}}
{{gap}}दुःखी, श्रमिक, शोकग्रस्त आणि तपस्वी या सर्वांच्या मनाला विसावा मिळावा (आणि पुन्हा प्रपंचातले टक्के टोणपे खाण्यासाठी ताजेतवाने होता यावे) म्हणून मी नाटक निर्माण केले, असा निर्वाळा नाट्यशास्त्रकर्त्यानेच दिला आहे. नाटक म्हणजे अनेक कलांचे संगमतीर्थ!

{{gap}}दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शारीरिक आणि मानसिक श्रम घ्यावेच लागतात. कधी कधी त्यांचा अतिरेक होतो. मग ताण वाढत जातात. अशावेळी कला आणि क्रीडा यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृतिशील सहभाग हा फार निरामय उतारा आहे.

{{gap}}प्रत्येक व्यक्तीजवळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची कल्पकता, नवसर्जनशीलता असते, आपल्या ऐहिक गरजांसाठी ती वापरली जातेच. पण जेव्हा व्यावहारिक लाभ हानीची गणितं ओलांडून तिचा उपयोग होतो तेव्हा जे निर्माण होतं तीच कला! त्यातून मिळणारा आनंद हा कलात्मक आनंद! ज्या आनंदाला व्यावहारिकतेची कुंपणं नसतात; नसावीत. असा एक कोपरा सुबुद्ध माणसाने प्रयत्नपूर्वक जतन करायला हवा. प्रपंचाच्या ऐन धकाधकीतही त्याच्यासाठी शक्ती आणि वेळ ठेवावा. मग 'ताणमुक्तीच्या' नावाखाली 'बिझिनेस पार्टी'च्या नावाखाली इतर मादक द्रव्यांच्या सेवनाची गरज रहात नाही. आपण काहीतरी आनंददायी निर्माण करू शकतो ही धुंदी पुरेशी ठरते; पण त्यासाठी त्या कलानिर्मितीत प्रत्यक्ष सहभाग हवा. केवळ दुसऱ्यांची गाणी ऐकून, टेपरेकार्डस् ऐकून, नाटके सिनेमे पाहून किंवा तत्सम अप्रत्यक्ष कलास्वाद हा एक प्रकारे माणसाला निष्क्रीय करतो. हे सर्व करताना स्वतः ही गाण्याची लकेर आपल्यापुरती आपल्यासाठीच निर्हेतुक छेडीत रहावी. आपण आपल्यासाठीच नृत्याच्या ताललयीत कधीतरी झोकून द्यावं, आपण आपल्यासाठीच रंगांचे चार फटकारे कागदावर ओढावेत आणि आपल्याला अभिव्यक्त करीत रहावं. थोडक्यात म्हणजे

{{gap}}''"गाना आये ना आये गाना चाहिये।"''
{{gap}}तो आनंदाच्या मुळीचा झरा आहे. जीवनातले ढळते तोल सावरण्यासाठी आपल्याच रक्तातला आदिताल सर्वात प्रभावी उतारा आहे. त्यालाच कला म्हणायचं, दुसरं काय?

{{gap}}आपण सगळे तानसेन होऊ शकत नाही पण 'कानसेन' तर होऊ शकतो आणि 'बाथरूम सिंगर' तर असतोच असतो. तो गाता गळा एरव्हीही वाहता<noinclude>{{right|गाना आये ना आये... / २२}}</noinclude>
03pxdk5a0g1lj4a6g1hmzdu1bn4sdqu
237656
237655
2026-10-04T11:53:34Z

42rs2ljsdoykefq6u54luxu2gnfhdwz
237657
237656
2026-10-04T11:54:00Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
237657
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{block center|<poem>''"दुःखार्तानां श्रमार्तानां, शोकार्तानां तपस्विनाम्
विश्राम जननं लोके, नाट्यमेतद् मया कृतम् ।।"''</poem>}}
{{gap}}दुःखी, श्रमिक, शोकग्रस्त आणि तपस्वी या सर्वांच्या मनाला विसावा मिळावा (आणि पुन्हा प्रपंचातले टक्के टोणपे खाण्यासाठी ताजेतवाने होता यावे) म्हणून मी नाटक निर्माण केले, असा निर्वाळा नाट्यशास्त्रकर्त्यानेच दिला आहे. नाटक म्हणजे अनेक कलांचे संगमतीर्थ!

{{gap}}दैनंदिन गरजा भागविण्यासाठी शारीरिक आणि मानसिक श्रम घ्यावेच लागतात. कधी कधी त्यांचा अतिरेक होतो. मग ताण वाढत जातात. अशावेळी कला आणि क्रीडा यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृतिशील सहभाग हा फार निरामय उतारा आहे.

{{gap}}प्रत्येक व्यक्तीजवळ कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची कल्पकता, नवसर्जनशीलता असते, आपल्या ऐहिक गरजांसाठी ती वापरली जातेच. पण जेव्हा व्यावहारिक लाभ हानीची गणितं ओलांडून तिचा उपयोग होतो तेव्हा जे निर्माण होतं तीच कला! त्यातून मिळणारा आनंद हा कलात्मक आनंद! ज्या आनंदाला व्यावहारिकतेची कुंपणं नसतात; नसावीत. असा एक कोपरा सुबुद्ध माणसाने प्रयत्नपूर्वक जतन करायला हवा. प्रपंचाच्या ऐन धकाधकीतही त्याच्यासाठी शक्ती आणि वेळ ठेवावा. मग 'ताणमुक्तीच्या' नावाखाली 'बिझिनेस पार्टी'च्या नावाखाली इतर मादक द्रव्यांच्या सेवनाची गरज रहात नाही. आपण काहीतरी आनंददायी निर्माण करू शकतो ही धुंदी पुरेशी ठरते; पण त्यासाठी त्या कलानिर्मितीत प्रत्यक्ष सहभाग हवा. केवळ दुसऱ्यांची गाणी ऐकून, टेपरेकार्डस् ऐकून, नाटके सिनेमे पाहून किंवा तत्सम अप्रत्यक्ष कलास्वाद हा एक प्रकारे माणसाला निष्क्रीय करतो. हे सर्व करताना स्वतः ही गाण्याची लकेर आपल्यापुरती आपल्यासाठीच निर्हेतुक छेडीत रहावी. आपण आपल्यासाठीच नृत्याच्या ताललयीत कधीतरी झोकून द्यावं, आपण आपल्यासाठीच रंगांचे चार फटकारे कागदावर ओढावेत आणि आपल्याला अभिव्यक्त करीत रहावं. थोडक्यात म्हणजे

{{gap}}''"गाना आये ना आये गाना चाहिये।"''

{{gap}}तो आनंदाच्या मुळीचा झरा आहे. जीवनातले ढळते तोल सावरण्यासाठी आपल्याच रक्तातला आदिताल सर्वात प्रभावी उतारा आहे. त्यालाच कला म्हणायचं, दुसरं काय?
{{gap}}आपण सगळे तानसेन होऊ शकत नाही पण 'कानसेन' तर होऊ शकतो आणि 'बाथरूम सिंगर' तर असतोच असतो. तो गाता गळा एरव्हीही वाहता<noinclude>{{right|गाना आये ना आये... / २२}}</noinclude>
i9uorz171jcj2ziecbh8ls4j4j36exy
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/२४
104
112415
237653
2026-10-04T11:41:48Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ठेवून पहावा. अनोख्या आनंदाचा ठेवा सापडेल. आपल्या पारंपरिक जीवनशैलीत देवाधर्माच्या नावावर का होईना आरत्या, पदे, स्तोत्रे, अभंग, भजने हे सर्वांच्या गात्या गळ्याला प्रवाही..."
237653
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
ठेवून पहावा. अनोख्या आनंदाचा ठेवा सापडेल.
आपल्या पारंपरिक जीवनशैलीत देवाधर्माच्या नावावर का होईना आरत्या, पदे, स्तोत्रे, अभंग, भजने हे सर्वांच्या गात्या गळ्याला प्रवाही ठेवत होते. एक परीने ते गाण्यामधले अॅक्टिव्ह पार्टिसिपेशन (सक्रीय सहभाग) होते. आता नुसते दूरस्थ बसून ऐकणे पाहणे हे फार 'पॅसिव्ह' होत आहे. शरीर आणि मन दोन्हींची गुंतवणूक कलेत हवी, तरच पुरता आनंद भोगता येतो. अन्यथा चिंता, ताण, अस्वस्थता माणसाला ग्रासून टाकते.
कला आणि क्रीडा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोपर्यंत ते पोटापाण्याचा आणि रुपये आण्याच्या विनिमयाचे साधन होत नाही, तोवर त्यातून निखळ आनंद मिळतो. त्यामुळे चिंता ताण यातून तोल सावरतो. जी निर्मिती केवळ स्वान्तः सुखाय असते, ती माणसाला स्वर्गीय समाधान देते.
जी. ए. कुलकर्णी यांची एक सुंदर कथा आहे. एक फीडल वादक असतो. जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ फीडलवादक व्हायचे, ही त्याची महत्त्वाकांक्षा असते तो खूप मेहनत घेतो; अनेक स्पर्धा गाजवतो, महफिली गाजवतो. यशाच्या धुंदीत जगू पाहतो. पण मन शांत होत नाही. अशांतच राहते. हातात अखंड वाद्य असते. आता सर्वकाळ तो आणि वाद्य हेच एकमेकांचे असतात. त्याला खाण्यापिण्याचेही भान रहात नाही. चालता चालता एका पर्वतश्रेणीतून एका अरुंद वाटेवरून वाद्य वाजवीतच चालत राहतो, पाहणारांना भीती वाटते की, हा वाद्याच्या नादात कुठेतरी तोल जाऊन पडेल; पण घडते भलतेच. एका क्षणी नादावल्या अवस्थेत तो फिडल् फेकून देतो. पाहणारा म्हणतो, "आता त्याला दुसऱ्या कशाची गरज नाही. तोच एक फीडल् झाला आहे. आता तो तोल जाऊन पडणार नाही." कलावंताची कलेची समाधी म्हणतात ती हीच! त्याला आता बाहेरच्या कोणत्याच साधनाची गरज नाही. पूर्णपणे आत्मरंगात तो दंग झाला. सुख-दुःखाच्या, ईर्ष्या स्पर्धेच्या अतीत पल्याड जाऊन तो पोचला.
जी.एं.ची ही कथा जगण्याचं, आनंदानं सफल जगण्याचं एक फार मोठं सूत्र सांगते. एक परीने "आत्मरंगी मन रंगले" म्हणणाऱ्या संतांसारखी ही कलेची आत्मलीन समाधीच समाधानाची परमावधी ठरते. सुख सुख म्हणतात, ते वस्तूत आणि इयेत थोडंच सापडलं ?
'सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।'
हा जीवनाचा नित्य अनुभव असतो.
'वेड्या मना कर विचार । सुख थोडे दुःख फार ।'
असं आधुनिक कवीही सांगतात; पण या दुःखावर मात करण्याचा उताराही निरगाठ - सुरगाठ / २३<noinclude></noinclude>
cu29zp61qi824mx7uz0nneen49p1vaw
237658
237653
2026-10-04T11:58:19Z
JayashreeVI
4058
237658
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>ठेवून पहावा. अनोख्या आनंदाचा ठेवा सापडेल.

{{gap}}आपल्या पारंपरिक जीवनशैलीत देवाधर्माच्या नावावर का होईना आरत्या, पदे, स्तोत्रे, अभंग, भजने हे सर्वांच्या गात्या गळ्याला प्रवाही ठेवत होते. एक परीने ते गाण्यामधले अॅक्टिव्ह पार्टिसिपेशन (सक्रीय सहभाग) होते. आता नुसते दूरस्थ बसून ऐकणे पाहणे हे फार 'पॅसिव्ह' होत आहे. शरीर आणि मन दोन्हींची गुंतवणूक कलेत हवी, तरच पुरता आनंद भोगता येतो. अन्यथा चिंता, ताण, अस्वस्थता माणसाला ग्रासून टाकते.

{{gap}}कला आणि क्रीडा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोपर्यंत ते पोटापाण्याचा आणि रुपये आण्याच्या विनिमयाचे साधन होत नाही, तोवर त्यातून निखळ आनंद मिळतो. त्यामुळे चिंता ताण यातून तोल सावरतो. जी निर्मिती केवळ स्वान्तः सुखाय असते, ती माणसाला स्वर्गीय समाधान देते.

{{gap}}जी. ए. कुलकर्णी यांची एक सुंदर कथा आहे. एक फीडल वादक असतो. जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ फीडलवादक व्हायचे, ही त्याची महत्त्वाकांक्षा असते तो खूप मेहनत घेतो; अनेक स्पर्धा गाजवतो, महफिली गाजवतो. यशाच्या धुंदीत जगू पाहतो. पण मन शांत होत नाही. अशांतच राहते. हातात अखंड वाद्य असते. आता सर्वकाळ तो आणि वाद्य हेच एकमेकांचे असतात. त्याला खाण्यापिण्याचेही भान रहात नाही. चालता चालता एका पर्वतश्रेणीतून एका अरुंद वाटेवरून वाद्य वाजवीतच चालत राहतो, पाहणारांना भीती वाटते की, हा वाद्याच्या नादात कुठेतरी तोल जाऊन पडेल; पण घडते भलतेच. एका क्षणी नादावल्या अवस्थेत तो फिडल् फेकून देतो. पाहणारा म्हणतो, "आता त्याला दुसऱ्या कशाची गरज नाही. तोच एक फीडल् झाला आहे. आता तो तोल जाऊन पडणार नाही." कलावंताची कलेची समाधी म्हणतात ती हीच! त्याला आता बाहेरच्या कोणत्याच साधनाची गरज नाही. पूर्णपणे आत्मरंगात तो दंग झाला. सुख-दुःखाच्या, ईर्ष्या स्पर्धेच्या अतीत पल्याड जाऊन तो पोचला.

{{gap}}जी.एं.ची ही कथा जगण्याचं, आनंदानं सफल जगण्याचं एक फार मोठं सूत्र सांगते. एक परीने "आत्मरंगी मन रंगले" म्हणणाऱ्या संतांसारखी ही कलेची आत्मलीन समाधीच समाधानाची परमावधी ठरते. सुख सुख म्हणतात, ते वस्तूत आणि इयेत थोडंच सापडलं?
{{gap}}'''सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।'''
{{gap}}हा जीवनाचा नित्य अनुभव असतो.
{{gap}}'''वेड्या मना कर विचार । सुख थोडे दुःख फार ।'''

{{gap}}असं आधुनिक कवीही सांगतात; पण या दुःखावर मात करण्याचा उताराही<noinclude>{{left|निरगाठ-सुरगाठ / २३}}</noinclude>
5r5m03wll27scodb3t7ms45wf25btzs
पान:निरगाठ सुरगाठ.pdf/२५
104
112416
237654
2026-10-04T11:42:11Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ माणसाजवळच असतो. एखाद्या कलेची थोडी जरी 'कळ' अवगत असली तरी दुःखाच्या 'कळा' विसरता येऊ शकतात. "तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी।" म्हणून तर क्रौंच पक्ष्याच्या आनंदमन जोडी..."
237654
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
माणसाजवळच असतो. एखाद्या कलेची थोडी जरी 'कळ' अवगत असली तरी दुःखाच्या 'कळा' विसरता येऊ शकतात. "तुझे आहे तुजपाशी, परि तू जागा चुकलासी।"
म्हणून तर क्रौंच पक्ष्याच्या आनंदमन जोडीतल्या नराला पारध्याचा बाण लागला आणि क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून हळव्या हृदयाचे महर्षी वाल्मिकी शोकाकुल झाले; पण दुसऱ्याच क्षणी तो शोक प्रसंगच त्यांच्या अंत:करणातल्या प्रतिभावंत कवीला प्रेरणा देणारा ठरला आणि करुणरसपूर्ण, शोकसंतप्त भावना व्यक्त करणारा सुमधुर अनुष्टुभ् छंदातला श्लोक त्यांच्या मुखातून उमटला. तो जगाच्या पाठीवरच्या एका महान् महाकाव्याचा 'रामायणा'चा प्रारंभबिंदू होता. महाकवीच्या प्रतिभास्पर्शाने 'शोक' श्लोकरूप झाला. त्या रामायण महाकाव्याने अक्षरश: पिढ्यान्पिढ्यांच्या जनमानसाला मात्र समाधान दिले आहे. आनंद दिला आहे. महाकवींमुळे, कलावंतांमुळे वेदनेचा वेद होतो. आसूचे रूपांतर हसूमध्ये होते. हे सामर्थ्य आहे कलेचे! कलात्मक रसिक वृत्तीचे !

आपण सगळे काही महाकवी वाल्मिीकीची (किंवा व्यास मुनींची) प्रतिभा घेऊन जन्माला आलो नाहीत हे खरे! ते प्रतिभेचा महासागर होते हेही खरे! पण आपल्याजवळ त्या महासागरातला एखादा बिंदू निश्चित असतो. तो आपल्यामधल्या कलावंताची सर्जनशीलता, नवनिर्माणक्षमता चेतवतो आणि आपल्याही दुःखावर उतारा देणारे क्षणाचे हसू का होईना फुलवू शकतो. आपल्यासारख्या सामान्य माणसांना सरस्वतीकन्या बहिणाबाई चौधरींनी दिलेला संदेश या संदर्भात फार महत्त्वाचा वाटतो. आनंदाच्या चंद्रज्योती फुलवणारा वाटतो. बहिणाबाई म्हणतात-
"रडू नको माझ्या जीवा । तुला रड्याची रं सवंऽऽ (सवय)। रडू हंसव रे जरा । त्यात संसाराची चव ।।" हेच खरे!
गाना आये ना आये / २४<noinclude></noinclude>
s5ynjni070t59f2ldep7ahky3si1kqc